




![]() |
| गडावरून दिसणारे कपिलधारा तीर्थक्षेत्राचा दृश्य |
![]() |
| गडावरून दिसणारे कपिलधारा तीर्थक्षेत्राचा दृश्य |
![]() |
| गडाचा कडेवर भिंतबांधून बांधलेली टाकी |
![]() |
| गडावरील दुसरी टाकी. हिथून तुम्हाला मंदिर दिसते. |
![]() |
| गडाचा दुसरा बुरुज |
![]() |
| कातळात खोदलेल्या पायऱ्या |
![]() |
| कातळातुन पाझरणाऱ्या झऱ्या जवळ खोदलेली छोटी टाकी. ह्या टाकीतील पाणी पिण्या साठी स्वच्छ होते. |
![]() |
| गडावरील तिसरी कमी खोल अशी सपाट टाकी. हि टाकी बघितली असता मला हि टाकी आहे का अन्य दुसरा काही होता याची शंका होती. |
![]() |
| गडाची दुसरी सोंड . हिथे आम्ही खाली जाऊन बघितले असता हा ३० ते ३५ फुटाचा कातळ होता त्या नंतर सरळ वाट सोंडेवरून खाली जात होती. खालच्या फोटोत दिसेल तुम्हाला. |
![]() |
| हि सोंड तुम्हाला कावनई चा छोट्या घाट रस्त्यावर घेऊन जाते |
कपिलधारा :-






कावनई, बसगड
किल्ला फारच लहान आहे, वर आलं की सरळ दिशेला तलाव दिसतो त्याच्या डाव्या बाजूला एका बाबाची खोली, एक महादेव पिंडी, आणि जीर्णोद्धार करायला घेतलेले देऊन, शिवाय वाटेंट एक भग्नावस्थेत असलेली वास्तू कदाचित खोली असावी. तटबंदी चोहो बाजूंनी शाबूत नाहीये पण काही ठिकाणी अजून तग धरून आहे. किल्ला पाहायला अर्धा तास पुरेसा आहे. तलावा मागच्या बाजूला एक बुरुज आहे ज्याला बऱ्यापैकी तट शिल्लक आहे बाकी पाहण्यासारखे विशेष काही नाही. तलावातील पाणी पिण्यासाठी उत्तम नाही पण गरज पडली तर पिऊ शकतो कारण तलावात असंख्य मासे आहेत. बाबा रोज सकाळी त्यांना चुरमुरे खायला देतो असे दिसून आले. तर अशा ह्या छोटेखानी टेहेळणी किल्ल्यावर आम्ही रात्री 9.15 ला प्रवेश केला आणि गिरीश दादाच्या पायाखाली एक सापाच पिल्लू आलं. अरे बाबा साप, भीती निर्माण झाली पण काही अपाय झाला नाही. सर्वांनी सॅक ठेऊन टेंट साठी जागा शोधायला सुरुवात केली पण सुटलेला अति वारा आम्हाला ठोस निर्णय काही घेऊ देत नव्हता. शेवटी एक भाग निवडला पण त्या ठिकाणी पहिला टेंट लावता लावता आमची दमछाक झाली. मग परत मी, गणेश आणि स्वानंद दरवाजा बाजूस जागा मिळत्ये का पाहायला गेलो आणि पुढच्या 5 मिनिटात तटबंदीस लागून असलेली जागा पक्की करून आलो. तटबंदी मुळे वारा अडत होता आणि तेच आमच्या मदतीला आलं. पुढच्या अर्ध्या तासात तिन्ही टेंट लावून झाले आणि मग सगळे तयार झाले कसऱ्यातून घेतलेली पावभाजी खायला. थंडी वाढत होती आणि त्या बरोबरीने पोटातली भूक सुद्धा. हॉटेल वाल्याने भाजी व्यवस्थित बांधून दिल्यामुळे अजूनही बऱ्यापैकी गरम होती आणि मग पुढच्या काही मिनिटातच ती पावांसह आमच्या पोटात गेली सुद्धा. आशा थंडीत गडावर चांदण्या रात्री असं तिखट, testy खायला काय मजा येते म्हणून सांगू😊 बोले तो कडक… जणू आमची कोजागिरी साजरी झाल्यासारखी वाटत होती. बर तिखट झालं मग आता गोड काहीतरी हवंच ना! लगेच सॅक मधून केक बाहेर आला आणि क्षणात आमच्या पोटात विराजमान झाला😊 अजून मज्जा😊.
हे सगळे जिभेचे चोचले झाल्यावर आम्हा सर्वांचे वैचारिक चोचले पूर्ण होणे भाग होते. गडावर गेलं आणि इतिहासावर चर्चा नाही?? असं होणच शक्य नाही त्यामुळे मग महाराज, त्यांची रणनीती, संभाजी, त्यांची रणनीती, सध्या चालू असलेली आंबट कोल्ह्यांची संभाजी गाथा यावर चर्चा झाली. आणि मग जेव्हा निसर्ग आम्हाला आता बास झालं असे म्हणू लागला तेव्हा टेंट गाठून पुढच्या 10 मिनिटात निद्रेस आपलसं करून मी पलीकडल्या जगात गेलो सुद्धा. साधारण 4.30 च्या सुमारास अचानक जाग आली ती कोणाच्या तरी बोलण्याने, “ OMG look hear tents, wow कसलं भारी ना”, “ wow कितना सही हैं रे ये, बहोत अच्छा लग रहा हैं मुझे, हमे भी टेंट्स लाना चाहीये था ना, मजा आता बहोत”, असा मुलींचा आवाज आणि काही वेळाने त्यामागून “ अरे यार, तुम लोग चिललाओ मत, सोया कोई, उठ जायेंगें”, असा एक समजूतदार आवाज आला आणि मग परत शांतता झाली. तेव्हा आठवलं की कुशल ने सांगितलं होतं की एक मुंबईचा ग्रुप 3 वाजता येणार आहे ते काय तर म्हणे night ट्रेकिंग 3 वाजता किल्ला चढणार आणि 6 वाजता उतरणार, काय तर fad आलाय आजकाल ट्रेकिंग चं सगळीकडे.
सकाळी 6 च्या सुमारास उठलो आणि टेंट मधून बाहेर आलो ते उगवणाऱ्या सूर्याचं मोहक रूप पाहायला मिळालं आणि मन प्रसन्न झालं. पहाटे ऐकलेले आवाज कोणत्या प्राण्यांचे आहेत म्हणून तलावाकडे पाहिले तर अरे बाप रे साधारण 20 जणांचा ग्रुप होता. त्यांचं कॉर्पोरेट फोटो शूट चालू होतं तेही आजकाल fad आहे म्हणा, त्यामुळे किल्ल्यांवर यायचं पण किल्ल्याची माहिती न घेता किंवा महत्व न जाणता केवळ वेगवेगळी तोंड करून, विचित्र पोझेस मध्ये फोटो काढून घेणे हाच काय तो उद्योग. थोडावेळ ते सर्कशीतले विदूषकांसारखे चेहरे बघत टेंट आवरले आणि मग किल्ला पाहायला निघालो. किल्ला लहान असल्या कारणाने तो ग्रुप असे पर्यंत प्रातर्विधी ला जाणे टाळत होतो पण जसा तो ग्रुप उतरला तशी पहिले पोट हलके करून आलो आणि मग मागच्या बुरूजावर जाऊन जरा आजूबाजूचा परिसर पाहिला.
कावनई घोटी पासून 8 किलोमीटर वर आहे, त्याच्या मागे पूर्ण अप्पर वैतरणा जलसागर दिसतो आणि त्यामुळे वारा आणि थंडी भरपूर. मग किल्ला पाहून तळ्याकाठी आलो ते तलावातल्या असंख्य माशांनी आमचं दिलखूष स्वागत केलं. तो क्षण मनात साठवत परत किल्ला उतरायला घेतला आणि पुढच्या 20 मिनिटात कावनई गावात आलो.
कावनई किल्ला लहान आहे पण त्रंबकेश्वर च्या रस्त्यातील पहिला असल्यामुळे त्यावर घोटीकडून नाशिक, त्रंबकेश्वर आणि इगतपुरी कडे जाणाऱ्या वाटांवर नजर ठेवायची महत्वपूर्ण कामगिरी होती त्यामुळे छोटा पॅकेज बडा धमाका म्हणता येईल असा हा किल्ले कावनई आमचा बघून झाला.
तेथून पुढे बसगड ला रवाना झालो.
बसगड भ्रमंती पुढच्या भागात……
© सुमंत परचुरे.9820944493
झुंजार, ठाणे
![]() |
| वाकी गाव किव्हा वाकी फाटा. आणि येथून दिसणारा कावनई |
![]() |
| Add caption |
![]() |
| ह्या टाकीचा तिकडून आम्ही शेतातील वाट धरली. शेतातून काढलेला फोटो |
![]() |
| गडाचा सोंडेवरून दिसणारा बुरुज, हिथे कातळापाशी आल्यावर वाट डावीकडे जाऊन वर उजवीकडे दरवाजा जवळ घेऊन जाते. |
![]() |
| गडाचा मुख्य दरवाजा |
![]() | ||||
| मुख्य दरवाजाचा आत उजव्या बाजूला लागणारी गुहा |
![]() |
| डोंगराची गावात गेलेली सोंड |
![]() |
| गडाचा मुख्य दरवाजाचा आतील पायऱ्या |
डाव्या वाटेने जाताना गडावरून कपिलधारा तीर्थक्षेत्राचा पूर्ण दृश्य दिसते. बुरुजाचा जवळच एक वाट थोडी खाली जाते. तिकडे एक कातळात झऱ्या जवळच खोदलेली छोटीशी २ हात रुंद टाकी आहे. अजून हि कातळातून छोटीशी पाझर लागलेली होती. ते पाणी टाकीत साचत होते. टाकीतील पाणी साफ आणि स्वच्छ दिसत होते. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य वाटत होते. माझ्या आता नक्की स्मरणात नाही पण बहुतेक तिकडेच खाली किंवा वर कातळात कोरलेल्या झिजलेल्या पायऱ्या हि दिसतात.
पुन्हा वर वाटेवर आल्यावर एक वाट खाली सोंडेजवळ उतरते. आम्ही खाली जाऊन बघून आलो पण एके ठिकाणी ३० ते ४० फुटाचा मोठा कातळ लागतो. माझ्या अंदाजे बहुतेक तिकडे पूर्वी दोर लावून उतरत असावे असा अंदाज येतो. कारण तेवढा कातळ उतरल्यावर सोंडेवरून सरळ खाली जायायला वाट दिसते. हि वाट तुम्हाला कावनई गावाचा साधारण १. ३० किमी आधी रस्त्यात भेटते. घाटात वर आल्यावर हि सोंडेची वाट दिसते.
जाते वेळी आम्ही २ ते २.५० किमी चालत गेलो. तितक्यात आम्हाला जवळच तेथील गावातील एक रिक्षावाला घोटी ला जात होता. त्यामुळे तेवढा आमचा चालायचा वेळ वाचला. रिक्षावाल्याने शेअर मध्ये सोडल्याने आमच्या दोघांचे ३० रुपये घेतले. आम्ही ४.४५ पर्यंत इगतपुरीला पोहचलो. इगतपुरीहुन ५ ची एक्सप्रेस ट्रेन पकडून आम्ही मुंबईचा दिशेने निघालो.
![]() |
| मंदिरासमोरील तळे आणि बाजूला उजवीकडून वाड्याचे अवशेष आणि महादेवाचा पिंडी कडे घेऊन जाणारी वाट. |
![]() |
| गडावरील मंदिर आणि त्यासमोरील तळे |
![]() |
| गडावरील वाड्याचे अवशेष |
![]() |
| वाड्याचे अवशेष आणि महादेवाची पिंड |
![]() |
| गडावरून दिसणारी कळसूबाईची रांग . आणि गडावरील मंदिर आणि वाड्याचे अवशेष |
![]() |
| गडावरून दिसणारे हरिहर,भास्कर गड आणि अप्पर वैतरणा जलाशय |
![]() |
| कपिलधारा तीर्थक्षेत्र मध्ये तीर्थक्षेत्राची आणि कावनई गावाची माहिती दिलेली आहे |
कावनई
आता लक्ष्य होतं, इगतपुरीचा दुसरा किल्ला – कावनई! घोटी गावात न जाता, मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिककडं वळल्यावर लग्गेचंच डावीकडे कावनई फाटा आला. ट्रेकर्सचा ‘राष्ट्रीय आहार’ मिसळ-पाव चेपल्यावर घामटं आलं, अन् दोन कडक चहा मारून तरतरी आली.
अप्पर वैतरणा रस्त्यावरून उजवीकडे वळल्यावर मागं वाकी गावचा बुध्या डोंगर, समोर कावनई किल्ला अन् त्याच्या उजवीकडे दास्कोन डोंगर लक्षवेधी उठावले होते.
घरांच्या दाटीवाटीतून किल्ल्याकडे मळलेली वाट निघाली. कातळटप्प्याकडे तिरकं चढत वाट हळूहळू उभी होत गेली.
माथ्यावरचे बुरुज अन् ध्वज खुणावत होते, म्हणून झपझप पावलं उचलली.
गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचण्यासाठी पूर्वी बेचक्यातल्या नाळीतून ‘चिमणी’ तंत्राने किंचित अवघड कातळारोहण करावे लागत असे. गडावर कावनईदेवीच्या दर्शनाला येणा-या भाविकांसाठी आता लोखंडी शिडी आली. तरीही, पूर्वी इथली चढाई-उतराईचा थरार काय असेल, याची कल्पना येते.
प्रवेशद्वारापासून गडाची धारेवरची कावनई गाव अन् पाठीमागे मुकाणे – अप्पर वैतरणा धरणांचे जलाशय चमकत होते. अंजनेरी – त्र्यम्बक – डांग्या – गडगडा हे दुर्ग सवंगडी सहजंच ओळखू आले.
माथ्यावर निवासाच्या घरट्यांच्या जागा, खांबांचे खड्डे अन् चर बरेच दिसतात.
बाजूला होतं कावनईचा जोडीदार दास्कोनचं विहंगम दर्शन!
मध्यभागी तलाव अन् कावनईदेवीचं राउळ! गडावर स्वतः शिवाजीराजांनी काही दिवस वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे.
कपिलधारा तीर्थ
अडीच तासांत कावनईची चढाई-उतराई करून, पायथ्याचं ‘कपिलधारा’ हे प्राचीन तीर्थक्षेत्र गाठलं. कुंभमेळा मुळात इथला, असं मानतात. इथल्या घंटांपैकी एक घंटा चिनी वाटसरू ह्युआन स्तंगनं भेट दिलीये म्हणे. असेल!
प्रचिमध्ये दाखवलेल्यांपैकी ती घंटा नाहीये. खरंतर ती एक धातूची प्लेट आहे. तिथेच जर चौकशी केली असतीत तर त्यांनी ती प्लेट दाखवली असती. त्यांवर काही चिनी आकृत्या कोरलेल्या आहेत.
ऊन जब-या पेटलं होतं – शंकाच नाही.
नरेंद्र ढाब्यावर टेकलो. बाहेर एक-एक डोंगर, त्यांच्या सोंडा, झुडपं, कातळमाथे, घसारा असं सग्गळं कळाकळा उन्हांत तापत होतं. खरं सांगू, ते काही बघावसंही आता वाटेना. पुढचा बेत काय याबद्दल थोडी डळमळीत मनस्थिती. एकदा वाटलं, दोन किल्ले मोरधन अन् कावनई झाले आहेतंच, अन् परतीचा प्रवास २०० किमीचा. तिसरा किल्ला – त्रिंगलवाडी सोडला तरी चालेल. मग वाटलं, त्रिंगलवाडी साठी इतकं लांब परत कधी येणार, अन् तो आत्ता सोडला तर नंतर खूप regret वाटत राहील.. अर्थात हे नक्की होतं, की त्रिंगलवाडी करायचाच असेल, तर मनापासून बघू शकणार असू तरंच.
शरीराला खूप गरम - खूप गार असा शॉक बसू नये, या पध्दतीनं थोड्या विश्रांतीनंतर ताक – लस्सी – कोल्डड्रिंक्स असा मारा केला. थोडक्या विश्रान्तीनंतर त्रिंगलवाडी करायचा की नाही, यावर विचार करण्यासारखं काहीच राहिलं नाही...
कावनई किल्ला आणि त्याच्या शेजारचा बुधला (कावनईकडे जाताना)
गावकर्यांचा विरोध मोडून काढत तडकाफडकी कावनई किल्ला चढायला सुरूवात केली. अगदी छोटेखानी किल्ला असल्याने फार वेळ लागणार नाही असा अंदाज होता. त्याप्रमाणे थोडे चुकत माकत तासाभरात गडावर पोहोचलो देखील. पटापट एक मोकळी जागा पाहून तंबू ठोकला. अमेयने मॅगी विथ टोमॅटो सूप असा एक खास प्रकार बनविला होता. त्या इवल्याश्या किल्ल्यावर आम्ही तिघेच, बाहेर कमालीचा गारवा आणि आत आम्ही छानपैकी गरमा गरम सूप आणि मॅगी ओरपत होतो. वाहवा, त्याची आठवण झाली तरी तोंडाला पाणी सुटते.
जेवण उरकल्यावर जवळच्या तळ्याकाठी निवांत पहुडलो चांदण्या मोजत आणि थंडी अगदीच वाढल्यावर निवांत येऊन झोपलो.
दिवस दुसरा -
दुसर्या दिवशी सकाळी उठून गडाचा फेरफटका मारला.
अस्मादिक...झोप नीट झालेली नाहीये
सूर्योदयाची काही दृश्ये
खरेतर तर किल्ला एवढा छोटा आहे की त्याला किल्ला म्हणण्यापेक्षा पहार्याची चौकी म्हणणे जास्त योग्य ठरेल. त्या इटूकल्या माथ्यावर एक छानसे तळे आणि त्याच्या काठी एक पिटूकले मंदिरही होते. त्यावर छानपैकी भगवा फडकत होता. पाहूनच मन प्रसन्न व्हावे असा देखावा.
पटापट आवरले आणि दुपारच्या सुमारास गड उतरून खाली आलोदेखील.
चौघीजणी
खाली आल्यावर गावकर्याच्या आग्रहाला मान देऊन तिथून जवळच असलेले कपीलधारातिर्थ हे देवस्थान पहायला गेलो आणि गेल्याचे सार्थक झाले. अतिशय सुंदर असे हे ठिकाण आहे.
थोडी फोटोग्राफी करून पुन्हा एकदा घोटीला दाखल झालो. घोटी या भागाचे सेंटरप्लेस आहे. वर्तुळाच्या मध्यभागी असल्यासारखे. कोणत्याही गावाकडून दुसर्या गावाकडे जाताना घोटीला येऊनच पुढे जावे लागते.दरम्यानच्या काळात आम्हाला अशी माहिती कळाली ही इथे ताकेद म्हणून एक गाव आहे आणि महाशिवरात्रीला तिथे मोठी यात्रा भरते. त्यामागची आख्याईका अशी आहे की, रामायणात सीतेला पळवून नेताना रावणाची जटायूशी लढाई झाली. त्यात कपटाने रावणाने जटायूला मारले. त्यानंतर सितेला शोधत शोधत राम-लक्ष्मण आले तेव्हा जटायूने कहाणी सांगीतली आणि मरण्यापूर्वी पवित्र तिर्थ प्राशन करण्याची इच्छा व्यक्त केली. रामाने जमीनीत बाण मारला आणि त्या जागेवरून बारा तिर्थांचे पाण्याची धार निघाली. आजही दर बारा वर्षांनी तिथे हा चमत्कार घडतो असे मानतात. त्यामुळे आम्ही जिथे जाऊ तिथे प्रत्येक गावकर्याने आम्हाला मोठ्या भक्तीभावाने ही कथा सांगून ताकेदला जायचा आग्रह केला. शेवटी शेवटीतर ही कथा आम्हाला इतकी पाठ झाली की झोपेतही मी ही सगळी कथा सांगू शकेन.
साईंनी विंग्रजी माहिती शोधली असणार म्हणून दसकोन चे दासकोन->दास्कोन झाले असणार..
बितनवाडीहून टाकेदकडे जाताना रस्त्यात लागलेले व्याघ्रशिल्प

– –
बितनगड व त्याचे सह्यपाठीराखे

टाकेद हे सर्वतीर्थ पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध.. इथेच रावणाशी युद्ध करून जखमी झालेल्या गरुड राज जटायू साठी प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारून सर्व तीर्थांना बोलाविले अशी कथा आहे.. इथे बारामाही वाहणारा झरा आहे जिथे काळ्या पाषाणात बांधलेले कुंड आहे.. सभोवताली जटायू मंदीर, श्रीराम मंदीर, श्रीदत्त मंदीर, महादेवांचे व हनुमानाचे मंदीर असा परिसर आहे.. येथील श्रीराम-लक्ष्मण-सीता व श्रीदत्त यांची मुर्ती खूपच सुंदर आहे.. बाकी परिसर सर्वतीर्थ म्हणून ख्याती असल्याने बराचसा चकाचक नि स्वच्छ ! भाविकांची वर्दळ असणारच.. बाजूलाच अजुन एक असलेल्या मोठया कुंडात बच्चाकंपनी अगदी जोमाने सुर मारुन पाण्यात डुंबत होते.. मुख्यकुंडाच्या जवळच बाहेर एक पिंड असून त्यात जमिनीत आत एक गुळगुळीत दगड ठेवला आहे.. मनात इच्छा ठेवून तो बाहेर काढल्यास इच्छापुर्ती होते इति तेथील लोकांची श्रद्धा आहे ! पण हे आम्हाला अॅनिने सहजतेने दगड बाहेर काढल्यानंतर कळले.. जल्ला अॅनिची इच्छापुर्तीची संधी अधुरीच राहीली.. !
– –
हे सगळे पाहेस्तोवर जठाराग्नी चांगलाच
भडकलेला.. तेव्हा लगबगीने परतीची वाट धरली… कोजागिरी पौर्णिमेचे निमित्त
घेउन अकस्मात ठरवलेला हा ट्रेक सुंदर आठवणींमुळे अगदी बहारदार ठरला. खरेतर
हा ट्रेक ठरवूनही प्लॅन बोंबलणार होता.. माहिती काढून झाली तरी
संध्याकाळपर्यंत काहीच निश्चित नव्हते.. अगदी मंडणगडापासून ते
साल्हेर-मुल्हेर ते चक्क लिंगाणापर्यंत गडांची नावे घेउन झाली.. फक्त ट्रेक
रद्द होण्याच्या मार्गावर होता ! पण शेवटी सारे आलबेल होउन मस्त- मस्त
ट्रेक झालाच.. शिवाय संपुर्ण ट्रेकमध्ये पाठीवर सॅकची ओझी नसल्यामुळे तर
अगदी रॉयल ट्रेकच वाटला.. आता इतके सगळे शानदार झाले तर शेवटही शानदार
जेवणाने करुया म्हणत एका हॉटेलमध्ये चटकदार वेज-नॉन वेज जेवणाचा आस्वाद
घेतला.. आगामी ट्रेकबद्दल गप्पा झाल्या नाही तर नवलच.. ! पण कसे आहे ना..
आम्ही जाऊ तेव्हा जाऊ ! तेव्हा पुढील संधीच्या प्रतिक्षेत.. ! 
पवित्र कावनई
“मना रे जनी मौन्यमुद्रा धरावी , कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडोनि द्यावे, सुखालागी अरण्ये सेवीत जावे.”
किती सार्थ ओळी आहेत ह्या समर्थ रामदासांच्या. रोजच्या धकाधकीच्या हरवलेल्या जीवनातून जर स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर प्रत्येकाने निसर्गाच्या, गडकिल्यांच्या सहवासात गेले पाहिजे. निसर्ग तुमच्याशी हितगुज करतो, हा विशाल हृदयाचा सह्याद्री सगळ्यांना सामावून घेतो.


माझीही काहीशी अशीच स्थिती झाली होती, त्यामुळे यंदा भन्नाट ट्रेक करूयात असे सर्वानुमते ठरले. मग बऱ्याच दिवसांपासून मनात रेंगाळणाऱ्या ‘पवित्र कावनई’ ला जाण्याचे योजिले. ठरल्याप्रमाणे १३ ऑगस्ट ला काळे काका आणि आम्ही चौघे कावनई येथे जाण्यासाठी सकाळी ६ वाजता निघालो. आठवडाभर शांत असणाऱ्या पावसाने नेमकी रविवारच्याच दिवशी दणकून हजेरी लावली आणि आमची त्रेधातिरपीट उडवली.
कावनई किल्ल्याच्या परिसरात, सांख्य तत्वज्ञानाचे निर्माते असलेल्या कपिल मुनींचा आश्रम आहे. आश्रम परिसरात श्रीराम पंचायतन व इतर अनेक देवांच्या भव्य मूर्ती आहेत. मंदिराच्या खाली स्वच्छ पाण्याचे कुंड आहे. येथे गोमुखातून सतत पाण्याची धार चालू असते. कुंभमेळ्याचे मूळ स्थान ‘कावनई’ आहे, पण पेशव्यांनी कुंभमेळ्याचे विभाजन केल्या पासून, शिवउपासकांचा कुंभमेळा त्रंबकेश्वरला तर रामउपासकांचा कुंभमेळा नाशिकला होतो. या सर्व परिसराला कपिलधारा क्षेत्र असे नाव पडलेले आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर घोटीपासून ८किमी अंतरावर कावनई गाव आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे त्याच्याकरिता आसुसलेली धरणी संतुष्ट झाली. सारे आसमंत चिंब चिंब भिजले. वातावरण अगदीच प्रसन्न होते. नखशिखांत भिजून रस्ता अगदी निपचित पडलेला होता. त्याच्या दुतर्फा भाताची कोवळी रोपं नुकतीच माना वर काढू लागली होती. अशा रम्य वातावरणात, मंदिराच्या मागे गाडी पार्क केली आणि आडोशाला थांबून पाऊस ओसरण्याची वाट पाहू लागलो. पाऊस कमी झाला आणि आम्ही गावातून किल्याची वाट धरली. कावनई गाव लहान असून तिथे आदिवासी लोकांची वस्ती आहे.

जसजसे वर चढू लागलो तसतसा पावसाचा जोर वाढू लागला. वारा आणि पाऊस ताल धरून मेघमल्हार गाऊ लागले आणि मी ही त्यांच्या मैफिलीत सामावून गेले. या सगळ्यात छत्रीची मात्र फजिती उडत होती. आणि त्यामुळे आमचा चढाईचा वेग मंदावत गेला. गावातून सुमारे ३० मिनिटे किल्याच्या दिशेने चढल्यावर किल्याच्या कड्याखाली पोहोचलो.

किल्याचे प्रवेशद्वार कावनई गावाच्या विरुद्ध बाजूस आहे, त्यामुळे कड्याच्या उजव्या बाजूची वाट धरून हलक्याशा चढाईने चढत राहिलो आणि किल्याचे एकमेव प्रवेशद्वार दृष्टीक्षेपात आले. थोडं क्लाइम्बिंग करून गेल्यावर पुढे आधाराला लोखंडी शिडी बनवली आहे. दगडांवर शेवाळे सजल्यामुळे; घसरतो की काय ही भिती मनाशी होतीच. पण सगळे जण व्यवस्थित चढले.


पुढे उजव्या अंगास चार-पाच जण मावतील एवढी खोदलेली गुहा लागली. इथून सुमारे तीस पायऱ्या चढून गेल्यावर गडमाथा लागला. कावनईचा गडमाथा छोटाच आहे आणि संपूर्ण किल्याला फेरफटका मारायला तासभर पुरेसा होतो. गडमाथ्यावर आल्यानंतर आम्ही मोर्चा डावीकडे वळवला आणि थोड्याच अंतरावर पाण्याचा तलाव दिसला. तलावाच्या काठाशी ‘कावनई’ देवीचे छोटेसे मंदिर पाहून मन प्रसन्न झालं आणि आपसूकच आशीर्वादासाठी मनोमन दंडवत घातला. बाहेर पाऊस चालूच असल्याने आम्ही मंदिरातच सहभोजनाचा आस्वाद घेतला, आणि पुन्हा गडभ्रमंतीला सुरवात केली. इमारतींचे, वाड्यांचे अनेक अवशेष बघितले.


गड-किल्ले म्हटल्यावर तिथे महादेव नाही असं सहसा होतच नाही, कावनई ही त्याला अपवाद नाहीच. कुंभमेळ्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या इथे या महादेवाला वादळ-वाऱ्याशी सामना करावा लागतोय हे पाहून मन उदास झाले;पण वाटलं, त्याचंच तर आहे सगळं…कदाचीत त्याचीही तशीच इच्छा असावी. असो….



पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्या गडावर आहेत, त्यांना बारमाही पाणी असते. वाड्याचा एक चौथरा अजूनही शाबूत आहे. वैतरणेचे पाणी आणि आकाशातील ढग एकच झाल्याचा भास मनाला सारखा होत होता. ढग असल्यामुळे दूरवरचे काही दिसत नव्हते पण इथून दक्षिणेला मोरधन, अलंग, मदन, कुलंग,आणि कळसुबाई तर उत्तरेला त्रिंबक रांग हे सह्याद्रीचे शिलेदार दिसतात. गडावर फेरफटका मारून पुन्हा आल्या वाटेनेच कावनई उतरून आलो. सोबतीला सखे सवंगडी वारा, पाऊस आणि सह्याद्री होतेच…
कावनई बद्दल अशी आख्यायिका आहे की , रामायणात हनुमंताने द्रोणगिरी पर्वत उचलून नेताना त्याला ‘कालनेमी’ नावाचा राक्षस आडवा आला. हनुमंताने या ठिकाणी त्या राक्षसाचा नाश केला असल्याने, या ठिकाणाला ‘कावनई’ नाव पडले. अशा ह्या ‘पवित्र निसर्गरम्य कावनई’ पुढे मनोमन नतमस्तक होऊन आम्ही नाशिकचा रस्ता धरला.



न कळे मजला…

ट्रेक दिनांक- १३ ऑगस्ट २०१७
रविवार
जवळचे गाव- घोटी
तालुका- इगतपुरी
ठिकाण- नाशिक, महाराष्ट्र
डोंगररांग- त्रिंबक डोंगररांग
प्रकार- गिरिदुर्ग
उंची- ९१४ मी.(३००० फूट )
किल्ल्याचे दुसरे नाव- कावनी
सोबत- किरण काळे, जयंत, स्मिता, क्षितिजा धामणे
© ऋतुजा धामणे
सर्व फोटो / लिखाण हक्क राखीव.
कावनई
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : २९२० फुट
श्रेणी : मध्यम
कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुळ ठिकाण म्हणुन आजही प्रसिध्द आहे पण
या ठिकाणापासुन काही अंतरावर असलेला कावनई किल्ला आजही पर्यटकांना माहित
नाही. मुंबई-पुणे –नशिक या ठिकाणाहुन केवळ एक दिवसात या किल्ल्याला भेट
देता येते. मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईहुन जाताना घोटीच्या पुढे ४
कि.मी. अंतरावर खंबाळे गावाजवळ डाव्या बाजुला कावनई फाटा फुटतो. या
फाट्यावरून ३ कि.मी.आत आल्यावर वाकी येथुन उजव्या बाजुला एक रस्ता जातो.
रस्त्याच्या सुरवातीलाच किल्ले कावनई असे लिहिलेली एक कमान असुन या
कमानीपासून कावनई हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव ४ कि.मी. अंतरावर आहे.
नाशिक शहरापासून हे अंतर ४५ कि.मी. तर इगतपुरीहून हे अंतर १७ कि.मी.आहे.
सिंहस्थामुळे येथील कपिलधारा तीर्थाचा विकास झाला असुन वाकी ते कावनई रस्ता
सिमेंटचा करण्यात आला आहे. कावनई गावाअगोदर कपिलधारा आश्रम असुन त्यापुढे १
कि.मी वर कावनई गाव आहे.
कावनई गाव उंचावर असल्याने आपली काही चढाई गाडीने पार होते. गावात
शिरल्यावर समोरच उजव्या हातालाच किल्ला दिसतो. गावात महादेवाचे व हनुमान
मंदिर असुन हनुमान मंदिरात बजरंगबलीची भव्य मूर्ती आहे. गावात दोन लहान
वाडे व मंदिरांच्या आजूबाजूला काही मुर्ती व कोरीव दगडी अवशेष पहायला
मिळतात. गावाच्या उजव्या बाजुला कावनाई किल्ल्याची एक सोंड गावात उतरताना
दिसते. या सोंडेवरुनच गडावर जाणारी रुळलेली वाट आहे. या वाटेवरील लक्षात
ठेवण्याची खुण म्हणजे या वाटेच्या सुरवातीलाच एक उंच सिमेंटची पाण्याची
टाकी आहे. हनुमान मंदिरा समोरून एक वाट या टाकीच्या दिशेने जाते. वाटेच्या
सुरवातीलाच आपल्याला एक कबरवजा समाधी दिसुन येते. या समाधीवर दिवा
लावण्याची सोय केलेली आहे. या सोंडेवरून वळणे घेत गेल्यावर सोंडेच्या शेवटी
एक छोटे टेकाड लागते. या टेकाडाच्या वरील बाजूस गडाचा कातळ व त्यावरील
बुरुजावर फडकणारा भगवा दिसुन येतो. येथुन वाट डावीकडे वळुन परत उजवीकडे
फिरते व गडाच्या कड्याखालुन एका घळीतुन थेट गडाचा दरवाजापर्यंत घेऊन जाते.
घळीत आल्यावर घळीच्या वरच्या बाजुला कड्यात असलेला दरवाजा दिसुन येतो. या
घळीत असलेल्या कातळातील कोरीव पायऱ्या तसेच बांधीव पायऱ्या व तेथे पडलेले
दगडी अवशेष घळीच्या खालील बाजूस पुर्वी अजुन एक दरवाजा असल्याच्या खुणा
दर्शवतात. घळीच्या खालील बाजुस असणाऱ्या पायऱ्या आजही शिल्लक असुन वरील
बाजुच्या पायऱ्या झिजुन गेल्याने त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावलेली आहे. या
शिडीच्या टोकावरूनच आपला गडाच्या उत्तरभिमुख दरवाजाने गडावर प्रवेश होतो.
कड्यात असला तरी आजही हा दरवाजा तग धरून उभा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजुस
काही अंतरावर दोन बुरुज असुन दरवाजाच्या आत उजव्या बाजूला एक लहानशी गुहा
आहे. या गुहेत एक दगडांनी भरलेले लहानसे खोदीव टाके असुन प्रसंगी ४-५ जण या
गुहेत सहज राहु शकतात. दरवाजाच्या वरील बाजुस तीव्र चढाच्या २५-३० पायऱ्या
असुन या पायऱ्यांच्या डाव्या बाजूस असलेल्या बुरुजावर एक मातीने बुजलेले
लहान टाके आहे. दरवाजातुन पायऱ्या चढुन आल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश
होतो. पायथ्यापासुन येथवर येण्यास दिड तास लागतो. समुद्रसपाटी पासून २३७०
फुट उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्याचा माथा साधारण त्रिकोणी असुन ६ एकर
परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. गडमाथ्यावर आल्यावर डावीकडील वाटेने गड
पहाण्यास सुरवात करावी. वाटेच्या सुरवातीला सर्वप्रथम काही उध्वस्त घरांची
जोती व भिंतीचे अवशेष दिसुन येतात. येथील टोकाच्या बुरुजावरून आपल्याला
समोरच कोथळीगडाच्या आकाराचा डोंगर दिसुन येतो. या वाटेच्या उजव्या बाजुस
पाण्याने भरलेला मोठा तलाव असुन या तलावाची एक बाजु विटांनी बांधुन काढलेली
आहे. तलावाच्या डाव्या बाजुस एक छप्पर नसलेली वास्तु असुन या वास्तुच्या
पुढ्यात एका चौथऱ्यावर उघड्यावरच शिवलिंग व नंदी ठेवलेला आहे. तलावाच्या
काठावर एक लहानसे कावनई (कामाक्षी) देवीचे मंदिर आहे. या मंदिरात एक जुनी व
एक नवीन संगमरवरी मुर्ती अशा देवीच्या दोन मुर्ती आहेत. मंदिराच्या मागील
बाजुस दोन बुरुज आहेत. यात कपिलधारा तीर्थाच्या दिशेने एक बुरुज असुन या
बुरूजावरून कपिलधारा तीर्थक्षेत्राचा संपुर्ण परीसर दिसतो. बुरुजाच्या
अलीकडे एक खडकात अर्धवट कोरलेले टाके व एक साचपाण्याचे टाके दिसुन येते. या
भागातील बुरुजाची तटबंदी आजही शिल्लक आहे. बुरुजाकडून एक पायवाट थोडी खाली
उतरताना दिसते. येथे कातळात कोरलेल्या काही पायऱ्या दिसुन येतात. येथुन
तटबंदीच्या कडेने पुढे जाताना वाटेच्या उजव्या बाजुला व मंदिराच्या मागील
बाजुस साचपाण्याचा एक कोरडा पडलेला तलाव असुन या तलावाच्या एका बाजुस खडकात
कोरलेले एक टाके आहे. यातील पाणी गडावर पिण्यासाठी वापरले जाते. याच
ठिकाणी वाटेच्या डाव्या बाजुस दरीच्या काठी डोंगरउतारावर खडकात कोरलेले एक
भलेमोठे टाके दिसुन येते. येथुन पुढे आल्यावर आपण ज्या सोंडेवरून वर आलो
त्या सोंडेच्या वरील बाजुस असलेल्या बुरुजावर पोहोचतो. हा बुरुज पाहुन आपण
मंदिराशेजारी असलेल्या उंचवट्यावर आलो असता एका वाड्याचे अवशेष दिसतात.
त्याच वाटेने थोडे पुढे उजवीकडे अजुन एका वाड्याचे अवशेष दिसतात. या
उंचवट्यावर एक ध्वजस्तंभ दिसुन येतो. या उंचवट्यावरून दक्षिणेकडे कळसुबाई
डोंगराची रांग दिसते तर उत्तरेकडे डाव्या बाजूला भास्करगड,
हरिहर,त्रिंबककगड,त्रिंगलवाडी आणि अप्पर वैतरणाचा जलाशय दिसतो. समोर
उत्तरेला अंजनेरी दिसतो. हि वाट पुढे आपण प्रवेश केला त्या मुख्य दरवाजा
जवळ जाते व आपली गडफेरी पुर्ण होते. गडावर बघण्यासाठी एवढेंच अवशेष
असल्याने साधारण एक तासात आपला संपुर्ण गड फिरून होतो. कावनई किल्ल्याची
बांधणी नेमकी कोणत्या काळात झाली हे माहित नसले तरी कावनई गावाशी असलेली
त्याची जवळीक पहाता हा किल्ला पुरातन काळापासून अस्तित्वात असावा असे
वाटते. कावनई किल्ल्याजवळ कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असून
पेशव्यांनी या कुंभमेळ्याचे विभाजन केल्यापासुन शिवउपासकांचा मेळा
त्रिंबकेश्वर येथे तर राम उपासकांचा मेळा नाशीक येथे भरू लागला. आजही
कपिलधारा येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. राम-रावण युद्धादरम्यान लक्ष्मणावर
शक्तीप्रहार झाला असता तो शुद्धीवर यावा यासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी
हनुमान ह्या तीर्थावरुन जात असता त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला व
त्यामुळे या गावाला कावनई नाव पडले अशी आख्यायिका प्रचलित आहे. कपिलधारा
येथील राम मंदिरात ह्यु-एन-त्संग या चिनी प्रवाशाने भेट दिलेली एक
थाळीसारखी चिनी घंटा आहे. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. ६२९ ते
६४५ या काळात त्याने भारताला भेट दिली होती. इ.स. ६४०मध्ये दुसरा पुलकेशी
चालुक्य व ह्युएनत्संगची नाशिकमध्ये भेट झाली होती. ह्युएनत्संगने या कावनई
येथील विद्यापीठाला दोन घंटा भेट दिल्या होत्या. त्यातील एक घंटा
दिल्लीतील पुरातत्व संग्रहालयात आहे. ह्युएनत्संग नाशिकमध्ये आला तेव्हा
नाशिकमध्ये कुंभमेळा भरला असावा कारण ह्युएनत्संगला बरेच साधू दिसल्याचे
त्याने नमूद केले आहे. कावनईच्या पायथ्याशी कपिलधारा तीर्थाजवळच श्री
कामाक्षी माता मंदिर आहे. या मंदिरालाही पौराणिक माहात्म्य आहे. रामाची
कामेच्छा पाहण्यासाठी आलेली पार्वती कामाक्षी देवी रूपात येथेच राहिली असे
रामायणात म्हटले आहे. निजामशाहीत असणारा हा किल्ला इ.स.१६३५-३६ च्या
सुमारास मोगलांनी जिंकुन घेतला. यानंतर इ.स.१६७०-७२ च्या सुमारास शिवकाळात
हा किल्ला मराठयांनी जिंकुन घेतला. पुढे इ.स. १६८८ च्या सुमारास हा किल्ला
परत मोगलांच्या ताब्यात गेला. यानंतर हा किल्ला मराठ्यांकडे केव्हा आला
याची नोंद सापडत नाही पण चिमाजी अप्पांच्या एका पत्रात याचा उल्लेख येतो.
कामाक्षी पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार पेशव्यांनी १७५० ते १७६५ या कालखंडात
केला असुन पेशव्यांनी कामाक्षी देवीला सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण
केल्याचा उल्लेख पेशवे दफ्तरात येतो. मंदिराकडे आजही हे दागिने उपलब्ध असुन
नवरात्रोत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. कावनई हे पुर्वी
तालुक्याचे ठिकाण होते पण १८६१ मध्ये इंग्रजांनी हे ठिकाण इगतपुरीला हलवले.
© Suresh Nimbalkar
बरेच दिवस ट्रेक नाही झाले की आम्हा भटक्या लोकांची पंचाईतच होते.. उगीच चुकल्यासारखे वाटते काहीतरी.. मग अश्यावेळी संधी मिळाली की संधीचे सोने करायचे.. मग एखादी टेकडी का असेना चढायची.. ट्रेक मस्ट होतो अशावेळी…
डिसेंबरमध्ये अनपेक्षितपणे कोकणातला डुंगोबा ट्रेक झाला होता.. पण नंतर दोन- तीन महीने या ना त्या कारणात्सव असेच सुके गेले.. काय करणार अरे संसार अरे संसार..
मार्च महिना उजाडला.. कालनिर्णय मध्ये असे लाल रंग बरेच येऊन गेले होते पण आता रंगपंचमीचा मुहूर्त दिसला.. नि ठरले जाऊ.. कुठेतरी जवळपास जाऊ.. तसेही केमिकल युक्त रंगांशी दोन हात करण्यात कधीच उत्साह नसतो.. ठरले .. गिरीने फर्मान सोडले.. कावनई उरकून घेऊ.. !! लगेच विन्या, मी हात वरती केले.. विन्याने गाडीसकट हात वरती केला.. राहिला एक मेंबर.. गाळलेल्या जागा भरण्याची जबाबदारी मी नेहमीच यशस्वीरीत्या पार पाडतो.. माझा ऑफिसमधला सहकारी राहुल याला बरोबर घेतले..
साडे-सहाच्या सुमारास बाहेर पडलो. हायवेला लागलो.. असेही आम्ही भुकेले असतोच त्यात नाश्त्याची वेळ.. पण एकामागून एक धाबे बंद दिसायला लागले नि आमचे धाबे दणाणले.. शेवटी एक व्यवस्थित हॉटेल लागले.. भरपेट खाऊन निघालो. आता थांबायचे होते थेट कावनईला..
नाशिक जिल्ह्यातला हा कावनई इगतपुरीहुन फार जवळ.. आतापर्यंत ट्रेकच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा नाशिकला जायचो तेव्हा हायवेला घोटी लागले की हा किल्ला बघायचो.. नंतर करू नंतर करू म्हणत राहीलाच होता. ह्याचा आकारच असा की दुरून लगेच ओळखता येतो..
आमची गाडी घोटीला कावनई फाट्याकडे घातली.. नि आता कावनई अगदी नाकासमोर दिसू लागला..

पायथ्याचे गाव तसे उंचावरच आहे व चांगला डांबरी रस्ता त्यामुळे अर्धी चढाई गाडीनेच पार झाली.. पायथ्याकडच्या गावात पोचलो तेव्हा कावनई अगदीच टप्प्यात दिसत होता.. गावातले हनुमानाचे मंदिर छानच नि बजरंगबलीची मूर्ती अगदी भव्य.. मंदिरासमोरच गाडी लावणार होतो पण एका गावकऱ्याने आडोश्याची जागा दाखवली नि गाडी व्यवस्थित पार्क झाली.. इथे रंगपंचमी साजरी होत नसावी कारण तसे काही दिसले नाही..
आम्ही गावामागच्या रस्त्याने चढायला घेतले..मार्च चा महिना तेव्हा उन चढायच्या आत खाली उतरायचे होते.. वाट ठळक नि चढण अगदी सोप्पी.. नागमोडी वळसे घेत वाट डोंगराच्या सोंडेवर चढते..

पुढे सरळ चढण लागते इथून मागे पाहीले तर मुकणे धरण ते अप्पर वैतरणा जलाशयाचा सुंदर नजारा दिसतो.. व त्यामागे हरिहर, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी यांना कवेत घेऊन असलेली त्र्यंबक डोंगररांग..
हा नजरा बघून आम्ही पुढे सरसावलो.. सरळ खडी चढण व त्या चढणीवर वाट अशी नव्हती.. पण चढणीला बाजूला ठेवून डावीकडून एक ठळक वाट जाताना दिसली.. नि आम्ही फसलो.. !!

(डावीकडे दिसतेय ती फसवणारी वाट)
वाट ठळक होती त्यामुळे मनात काही शंका आली नाही. पण नंतर मुख्य डोंगर उजवीकडे राहतोय नि वाट काही संपत नाही असे वाटू लागले.. त्यात कावनईचा मुख्य दरवाज्यावर जाणारी शिडी दिसली.. आधी वाटले वळसा घालून वाट जात असेल.. पण नाही.. बाजूचा उघडा-बोकड डोंगर (कावनई चा बुधला / Dakson ) जास्त जवळ येतोय असे वाटू लागले. शेवटी आम्ही उजवीकडच्या शिडीला लक्ष्य केले नि मिळेल त्या ढोरवाटेने काट्याकुट्यातून चढून गेलो.. सोप्पी चढाई थोडीशी परिश्रमाची करून घेतली नि अर्धा तास फुकट घालवला..

शिडीच्या जागी कातळटप्पा आहे तेव्हा शिडी असल्याने सोयीस्कर पडते.. ही शिडी चढून गेलो की दरवाजा लागतो.. हा दरवाजा आजही तग धरून उभा आहे..
दरवाज्यानंतर पाचेक पायऱ्या चढून वरती आलो की उजव्या हाताला छोटी गुहा दिसते.. पुढे माथ्यावर आलो नि कडयावरुन दिसणारे दृश्य बघण्यात दंग झालो.. दूरवर असणारी भव्यदिव्य कळसुबाई रांग इथून छानच दिसते.. बाजूचा dakson नावाचा उघडा बोकड डोंगर तर उडी मारून ये म्हणून आव्हान देत उभा दिसतो..

कावनई चा माथा तसा छोटाच.. तरीही एक छोटा तलाव… तलावाच्या एका बाजूस पडकी इमारत व बिनछप्परात असलेले शिवलींग तर दुसऱ्या बाजूस देवीचे मंदिर.. एवढं सगळं विसावलेल आहे.. या मंदिरामागेच एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.. थोडं पुढे गेलो की बुरुज नजरेस पडतो..
एवढं सगळं बघेपर्यंत अर्धा तास पुरला.. आताशे अकरा वाजत होते पण उनाचा तडाखा जाणवू लागला होता.. गिरी म्हणत होता हरिहर किल्ला पण करून येऊ.. म्हटलं खाली उतरू मग बघू.. तसही कोणाची मानसिक तयारी दिसत नव्हती.. पंधरा-वीस मिनिटांत गड उतरून खाली आलो पण तप्त वातावरणामुळे हवालदिल झालो.. हरिहर सुध्दा उनात चढायला त्रासदायक असल्याने आम्ही आता त्रिंगलवाडी किल्ल्याचा विचार करू लागलो.. माझा व गिरीचा झाला होता पण म्हटलं वेळ घालवायचाय सो जाऊन येऊ..
कावनईच्या पायथ्याशीच कपिलाऋषींचा आश्रम आहे.. पण आम्ही आता गाडीतून उतरून आश्रमात जाण्यास निरुत्साही होतो.. आम्ही पुन्हा महामार्गावर आलो नि त्रिंगलवाडीसाठी इगतपुरीचा फाटा पकडला पण रस्ता चुकला नि इगतपुरी स्टेशनला पोहोचलो.. मागच्यावेळी इथूनच भलीमोठी पायपीट करत किल्ला गाठला होता त्याची आठवण झाली. पण आता त्याच वाटेने गाडी नेणे जिकरीचे असल्याने आम्ही त्या वाटेत लागणाऱ्या मोठ्या तलावापाशी येऊन थांबलो.. पावसाळ्यात येथील परिसर विविध गुणांनी नटलेला असतो मग ते हिरवे डोंगर असो वा डोंगरावर रेंगाळणारे ढग असोत वा वाटेत दुतर्फा फुललेली रानफुले असोत.. आता मात्र सगळं फ़िक्क पडलं होत.. तलवाचे पाणी देखील आटले होते.. पण इकडची शांतता मात्र मनाला भुरळ पाडते..
किल्ले कावनई (KAVNAI FORT)
पावसाने अचानक घेतलेल्या सुट्टीमुळे ह्यावेळी जरा उशिराने हजेरी लावत आहे. मागील रविवार हा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात गेला त्यामुळे तितकं काही जाणवलं नाही पण शेवटी आपली भटकंती ती भटकंतीच. पावसाची वाट पाहत पाहत ह्यावेळी शनिवार उजाडला. त्यात इतकं ऊन असताना सुद्धा शासनाची बंधनं, त्यामुळे नक्की जायचं कुठे हा नेहमीचा प्रश्न समोर होता. कर्जतच्या पट्ट्यातलं जास्त काही उरलं नाहीये म्हणून परत एकदा मोर्चा नाशिकच्या दिशेने वळवला पण तिथे सुद्धा बाकी काय राहिलंय हे शोधत होतो "काय नाई, काय नाई" करता करता शेवटी ज्यावर शिक्का मोर्तब झालं ते म्हणजे "किल्ले कावनई".
तीर्थस्थान आणि दुर्ग कावनई
ऐन उन्हाळ्यात शहरामध्ये फिरणंही अवघड झालं आहे. मग कुठे ट्रेकला जाणं तर दूरच. पण वसंताच्या या दिवसांत झाडांना फुटलेली नवपालवी आणि विविध रंगांच्या फुलांचा बहर अनुभवायचा तर मग घरातून बाहेर निघायलाच हवं. नाशिकरांनी सकाळी लवकर घर सोडलं तर दुपारच्या जेवणापयर्ंत पुन्हा परतता येईल अशा आटोपशीर भटकंतीचा छोटा आणि टूमदार ‘कावनई’ किल्ला आपल्याला खूणावतोय…

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
देवभूमी नाशिकमध्ये अजून सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता झालेली नाही. सिंहस्थ पर्वणीच्या तिथींना पाण्याची तेवढी टंचाई नव्हती. पण मुख्य पर्वणी काळ लोटला आणि काही दिवसांतच पाण्याचं तीव्र दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार्या ठिकाणांची पार्श्वभूमी बघितली तर त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या गोदाघाटाबरोबरच अजून एक नाव पुढे येतं ते म्हणजे ‘कावनई’.
सांख्यतत्वज्ञानाचे जनक असलेल्या कपिलमुनींचा आश्रम असलेले हे कावनई एक पावन तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. कावनई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला कपिलमुनींचा आश्रम बघण्यासारखा आहे. इथे गोमुखातून सतत पाणी निघत असते. गोमुखातून पडणार्या संततधारेमुळे या स्थळाचे नांव कपिलधारा तीर्थ असे पडले आहे. त्यापुढे बांधीव असे पाण्याचे कुंड तयार केलेले आहे.

कुंडातले पाणी अगदी काचेसारखे स्वच्छ असून त्यात मासे आणि कासव आहेत. हा आश्रम इथे अगदी प्राचीनकाळापासून आहे असे सांगीतले जाते. सातव्या शतकात भारतभ्रमणासाठी आलेल्या चीनी प्रवासी ह्युएन स्तेंग यानेही इथे भेट दिली होती. त्यावेळी त्याने आठवण म्हणून दिलेली चीनी घंटा या आश्रमात आजही बघायला मिळते. परंतु ही तबक प्रकारातली घंटा दुसऱ्या कुठल्या बौद्ध भिक्षू कडून दिली गेली असेल असे वाटते कारण, ह्युएन स्तेंग भेटीचा कुठलाही पुरावा नाही. कपिलमहामुनींना आपले इष्टदेव मानणार्या महानिर्वाणी आखाड्यासहीत कावनईच्या तीर्थावरही शाहीस्नानाची परंपरा आहे. असो.
कपिलधारा तीर्थ आश्रमाच्या पाठीशी उभा असलेला कावनई किल्ला इथून जरी उंच आणि मोठा दिसत असला तरी फार जास्त चढाईचा नाही. समुद्रसापाटीपासून ९१४ मीटर (३००० फूट) उंच असलेला कावनई पायथ्यापासून फार उंच नाही. किल्ल्याची पश्चिमेकडील डोंगरधार कावनई गावात येऊन मिळाली आहे. तिथूनच किल्ल्यावर चढाईला सुरुवात करायची. वर जाणारी वाट तशी अगदी ठळक असल्याने चुकण्याचा काही संबंध नाही.
काही ठिकाणी मुरमाड माती असल्याने घसरडी झालेली आहे पण धोकेदायक नाही. कावनई किल्ल्याच्या या मार्गावर फार झाडी नाही पण इतरत्र मात्र निवडूंग, बाभळी, निंब आणि पळस आदी झाडांचे विरळ असे वन आहे. पायवाटेने थोडं वर चढून आल्यावर आपण किल्ल्याच्या वरच्याभागात असलेल्या कातळ कड्याच्या खाली जाऊन पोहोचतो.

इथून किल्ल्याच्या उत्तर बाजूला मध्यभागी कातळात एक घळ दिसते. त्याघळीमध्ये वरच्या अंगाला कावनईचे प्रवेशद्वार आहे. खाली गावातून कितीही हळू आणि रमतगमत चढाई केली तरी तीस-चाळीस मिनीटांत आपण या प्रवेशद्वाराशी पोहोचतो. प्रवेशद्वारात पोहोचतांना घळ अतिशय अरूंद होत गेलेली आहे. त्यातून जरा सांभाळून चढावं लागतं. पण अगदीच अवघड अशा ठिकाणी दणकट अशी शिडी लावलेली आहे त्यावरून आपण सहज प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. छोट्या आकाराचे हे प्रवेशद्वार देखणे आहे. आत गेल्यावर एक गुहा कोरलेली दिसते. बहुदा पहारेकर्यांसाठी असावी. प्रवेशद्वारातून वर जाणार्या दहा -पंधरा पायर्या चढून गेलं की आपल्याला गडमाथ्यावर प्रवेश मिळतो.
कावनईचा गडमाथा फार विस्तृत नसला तरी त्यावर भला मोठा पाण्याचा तलाव आहे. शांत पाणी असलेल्या या तलावात कुरमुर्यांसारखा काही खाऊ टाकला तर शेकडोंच्या संख्येने असलेले मासे तीव्र हालचाली करत खाण्यासाठी वर येतात आणि संपूर्ण तलावाच्या पाण्यावर अनेक तरंग उठतात. बाराही महिने भरपूर पाणी असलेल्या या तलावा भोवती काही गडावशेष विखूरलेले आहेत.
तलावाच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी महादेवाची पिंड आणि नंदी बघायला मिळतात. तलावाला लागूनच छोटेसे देवी मंदिर आहे. या देवीला पण ‘कावनई’ नावाने ओळखतात. जवळच उद्धवस्त वाड्याचे अवशेष आहेत. तिथे एका साधूबाबाची कुटीया आहे. हे बाबा येणार्या सर्वांना भेटतात आणि त्यांच्यापरीने माहिती सांगतात. माथ्यावरील पुर्वेकडील भागावर काही बुरुज आणि तटबंदी दिसून येते.
तसं पहिलं तर उभ्या सरळसोट कातळकड्यांमुळे गडाच्या इतर भागात तटबंदी
उभारण्याची गरज भासलेली नाही. इथेही पाण्याची दोन-तीन टाकी आहेत. या
भागातून खाली कपिलधारा आश्रमाचा भाग आणि कावनई गाव न्याहाळता येतं. बाकी
गडमाथ्यावर भरपूर गवत आणि छोटी झुडूपं माजलेली दिसतात. कावनईच्या
माथ्यावरून अलंग, मदन, कुरंग सहीत संपूर्ण कळसूबाई रांग एकाच फ्रेममध्ये
नजरेत भरते. तर त्र्यंबकरांगेतीलही अनेक मानाचे पर्वत मान उंच करून
आपल्याला साद घालतांना दिसतात.
खालच्या आश्रमात ‘कावनई’ या नावाबद्दल थोडं विचारलं तेव्हा तिथल्या साधूबाबांनी रामायणातल्या प्रसंगाचा संदर्भ दिला.

हनुमानाने जेव्हा द्रोणागिरी पर्वत उचलून नेला तेव्हा त्याला वाटेत ‘कालनेमी’ नावाचा राक्षस आडवा आला. याच ठिकाणी राक्षसाबरोबर युद्ध झाले आणि हनुमानाने त्याला ठार मारले म्हणून या स्थळाचे नाव ‘कावनई’. असो. इतिहासात चिमाजी अप्पांनी कावनई किल्ल्याचे वर्णन केलेले आहे. ‘कावनई किल्ला आटोपसार, कडे थोर, पाणी पुस्कल सेंभर माणसांनी राखावा सारिखा आहे’ त्या आधी इ.स. १६७०-७२ च्या सुमारास कावनई हा स्वराज्याच्या यादीत होता. यानंतर १६८८ च्या सुमारास मोगलांनी किल्ल्याला वेढा घालून ताब्यात घेतल्याचा उल्लेख आढळतो. कावनई हा किल्ला टेहाळणीसाठी तसेच या परिसरातील मार्गावर देखरेखीसाठी उपयोगात आणला जात असावा.
कसे जाल
नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावरून घोटीच्या अलिकडे कावनईला जाण्यासाठी फाटा फुटतो.
नाशिकपासून अंतर किती
नाशिक ते कावनई ४३ कि.मी.; घोटी ते कावनई ८ कि.मी.
किल्ल्याची चढाई तशी सोपी आहे. गावातूनच किल्ल्याच्या एका सोंडेवरून रस्ता आहे.
पूर्वी दरवाजा गाठायला छोट्याश्या चिमणीतून हाताने खोबण्या पकडून पुढे जावे लागत असत पण आता शिडी लावल्यामुळे वाट अजूनच सोपी झाली आहे.
तासाभरातच आम्ही माथ्यावर पोहचलो. माथ्यावर तळ्यात शेवाळ्याच पाणी उरलेलं आहे.
पडक्या बुरुजाचे आणि बाजूच्या वाळलेल्या टाक्यांचे अवशेष बघत पूर्व-पश्चिमे कडील सह्याद्रीच्या रांगा, अप्पर वैतरणा चा पाण्याखालचा परिसर बघत असतानाच वातावरणात अचानक आलेला बदल जाणवायला लागला. कडक उन्हात गारवा जाणवत होता, ढगांची गडगड कानी यायला लागली. निळाशार आकाशातील पांढऱ्या ढगांची जागा आता पावसाला उऱ्हात घेऊन फिरणाऱ्या काळ्या ढगांनी घेतली. हवेतले असे रंग बघत आम्ही गड उतरायला सुरवात केली.
कावनईचे ग्रामदैवत : कामाक्षी माता - इगतपुरीनामा
इगतपुरी तालुक्यातील कावनई गावाला भरीव ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक
वारसा लाभलेला आहे.गावची ग्रामदेवता कामाक्षीमाता मंदिरात नवरात्रोत्सवात
धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मंदिराजवळ कपिल मुनीच्या
वास्तव्याने पावन झालेली भूमी कपिलधारा तीर्थ नावाने ओळखली जाते.
ब्रिटीश
काळात तालुक्याचे गाव अशी ओळख असलेल्या कावनई या गावाला धार्मिक वारसा
लाभल्याचा खुणा गावातील पुरातन मंदिर, किल्ले, तीर्थे यावरून स्पष्ट होतात.
गावातील कामाक्षी माता या जागृत देवस्थानात नवरात्रीमध्ये भाविकाची मोठ्या
प्रमाणात मांदीयाळी असते. मातेचा भक्त दर्शन झाल्याने समाधानासह सुखाची
अनुभूती घेतो. जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी भगवती अशी या देवीची ओळख
आहे. या देवीचा धार्मिक लाभलेला वारसाही अलौकिक आहे.
देवी मंदिर हे
पौराणिक महात्म्य लाभलेले भारतातील चार शक्तीपीठापैकी तिसऱ्या क्रमांकाचे
शक्तीपीठ आहे. भारतात कांचीपुरा, गुवाहाटी, कावनई आणि करंजगाव।( शेगाव ) ही
चार शक्तीपीठे आहेत. या शक्तीपिठात नवरात्रोत्सवात भाविक नवसपूर्तीसाठी या
ठिकाणी येत असतात. रामायणकाळात श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी जात
असताना इगतपुरी तालुक्यातीलच सर्वतीर्थ टाकेद येथे पक्षीराज जटायू हा जखमी
अवस्थेत मिळून येतो. तेव्हा या जटायूचा उद्धार करून प्रभू श्रीराम हे दंडक
अरण्यात सीतेचा शोध घेत आले. त्याच वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा श्रीराम
हा जप सुरु असताना माता पार्वती शंकरास म्हणाली जो राम आपल्या पत्नीचा
सांभाळ करू शकत नाही, त्या रामाचे ध्यान तुम्ही का करता ? यावेळी शंकराने
उत्तर दिले की, जो विचार तुझा आहे तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेवू
शकतेस. त्या वेळेस या दंडकारण्यात माता पार्वती सीतेच्या रुपात येवून
रामाला मोहित करू लागली. तेव्हा श्रीरामाने माता पार्वतीला ओळखून दंडवत
घातले. तेव्हा माता पार्वती प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली.
तेव्हा माझ्यासाठी आपण इथेच रहावे असा हट्ट श्रीरामाने धरला. तेव्हा माता
पार्वती या ठिकाणी कामाक्षी मातेच्या रुपाने राहिली. रामाची काम इच्छा
बघण्यासाठी आलेली ही कामाक्षी माता असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आढळतो. या
मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी इ.स..१७५० ते इ.स.१७६५ या कालखंडात केला
असल्याचे आढळून येते. पेशव्यांच्या महत्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली
तेव्हा पेशव्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षी देवीला सोने आणि चांदीचे अलंकार
दिले ते या देवीच्या मूर्ती वर दर नवरात्रोत्सवात आणि चैत्र पौर्णिमेला
चढवले जातात.
कावनई
वेशीवरच्या पाऊलखुणा : कावनई
ह्युएनत्संगच्या कावनई गावात!
एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक
महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच
वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते.
शिवशंकर, पार्वती, कपिलमुनी, श्रीराम, हनुमान, शुक्राचार्य, छत्रपती शिवाजी
महाराज, समर्थ रामदास, गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली
कावनई सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान आहे. कधीकाळी संख्याशास्त्र
अभ्यासासाठी जगभरात विद्यार्थी कावनईच्या गुरुकुलात येत. आता या गुरुकुलाचे
अस्तित्व फक्त ह्युएनत्संगने कपिलधारा तीर्थावर भेट दिलेल्या एका अनोख्या
घंटेमुळे आठवणींच्या नादांपुरते जाणवते. कावनईची पौराणिक व धार्मिक ओळख
अजूनही टिकून आहे, पण गरज आहे ती ह्युएनत्संगने भेट दिलेल्या गावाला
संख्याशास्त्र अभ्यासाचे गुरूकुल म्हणून नवी ओळख करून देण्याची.
नाशिक-मुंबई
महामार्गावर चाळीस किलोमीटरवर घोटीच्या अलीकडे कावनई फाटा लागतो. तेथून
सात-आठ किलोमीटरवर कावनई हे गाव लागते. कावनईपूर्वी तालुक्याचे ठिकाण होते.
१८६१पासून इंग्रजांनी कावनईऐवजी इगतपुरीला तालुक्याचे स्थान बनविले, तर
१८८५मध्ये इंग्रजांनी कावनईहून सरकारी खजिना इगतपुरीत आणला. सिंहस्थामुळे
कावनई तीर्थाचा विकास झाला आहे. महामार्ग ते कावनई रस्ता सिमेंटचा करण्यात
आला आहे. निसर्गरम्य कावनईत प्रवेश करताना गजानन महाराजांची तपोभूमी असलेले
साधना केंद्र लक्ष वेधते. येथील पंपासरोवर परिसरात गजानन महाराजांनी बारा
वर्षं तपश्चर्या केली होती व त्यानंतर ते शेगावला गेले होते. या केंद्रातून
पुन्हा कावनई रस्त्याला लागले की, एक लहानसा घाट लागतो अन् तो ओलांडला की,
लगेच कपिलधारा व कामाक्षी मंदिर आपले स्वागत करते. कपिलधारा तीर्थावर
निर्मळ पाण्याचा एक अक्षय झरा आहे. या कुंडातील गोमुखातून पाण्याची संततधार
असते, म्हणून याला कपिलधारा असेही श्री कपिलोपनिषद्मध्ये म्हटले आहे.
श्री कपिलधारा हे तीर्थक्षेत्र ११ लाख ३२ हजार वर्षांपासून प्राचीन क्षेत्र
म्हणून ओळखले जाते. कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असून पेशव्यांनी
दिलेला ताम्रपट येथे उपलब्ध आहे. आजही येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
कपिलधारा तीर्थावर सत्ययुगामध्ये शंकराच्या चोवीस अवतारांपैकी एक कपिल मुनी
यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या मातेस सांख्यशास्त्राचे उपदेश करून
मोक्ष दिला, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. त्यामुळे हे तीर्थ मातृगया तीर्थ
म्हणूनही ओळखले जाते. येथे स्नान करून आपल्या आईचे नाव घेऊन पाणी दिल्यावर
मनुष्य मातृऋणातून मुक्त होतो, अशी आख्यायिका आहे. याच तीर्थाच्या
दक्षिणेला राक्षसांचे गुरू शुक्राचार्यांचा आश्रम होता. त्यांनी
दण्डकारण्याला शापित करून येथील निसर्ग नष्ट केला. तो निसर्ग वनवासाला
आलेल्या श्रीरामाच्या चरणस्पर्शामुळे पुन्हा हिरवागार झाला. याचे अनोखे
वर्णन रामचरित मानसमध्ये वाचायला मिळते. या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी
ब्राह्मणाचे मृत मूल जल पाजून जिवंत केल्याची आख्यायिका सांगितली जाते.
तसेच या तीर्थावर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना उपदेश केला. तसेच
कावनई गावच्या एका ब्राह्मणाला कुंडातील तीर्थ देऊन कुष्ठरोग बरा केला,
असेही म्हटले जाते. संक्रांतीनंतर करी दिनाला ग्रहणांपासून संरक्षणासाठी
परिसरातील गावातून नागरिक स्नानासाठी या तीर्थावर येतात.
कपिलधारा तीर्थावर साक्षात हनुमानाचे चरण लागले आहेत. राम-रावण युद्धादरम्यान लक्ष्मणावर शक्तीप्रहार झाला असता, तो शुद्धीवर यावा, यासाठी श्रीहनुमान संजीवनी बुटी आणण्यास या तीर्थावरून जात होते. तेव्हा त्यांना अडवणाऱ्या कात्यनेमी राक्षसाचा त्यांनी येथे वध केला. त्यामुळे या गावाचे नाव कावनई असे रूढ झाले. कपिलधारा तीर्थाजवळ कावनई किल्लाही आहे. किल्ल्याची पडझड झाली आहे, मात्र किल्ल्यावर एक तळे, गुंफा व मंदिरे आहेत. कावनईच्या पायथ्याशी कपिलधारा तीर्थाजवळच शक्ती श्री कामाक्षी माता मंदिर आहे. या मंदिरालाही पौराणिक माहात्म्य आहे. भारतातील कांचीपुरा, गुवाहाटी, कावनई व करंजगाव (शेगाव) या चार शक्तीपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तीपीठ म्हणून कावनईला गणले जाते. एक आख्यायिका अशीही आहे की, या तीर्थक्षेत्रात श्रीराम व श्रीशंकराची भेट झाली होती. तर टाकेद येथे जखमी जटायूचा उद्धार करून राम जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत होते, तेव्हा कैलास पर्वतावर शंकराचा श्रीराम असा जप सुरू असताना पार्वतीने शंकरास विचारले, `जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही. त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता?’ त्यावर शंकर म्हणाले की, `तू जो विचार करतेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस.’ त्यावर पार्वती दंडकारण्यात सीता रूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. तेव्हा श्रीरामाने पार्वती माईला ओळखले व दंडवत घातले. पार्वती प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर निघाली. तेव्हा श्रीरामाने पार्वतीने येथेच राहावे, असा हट्ट धरला. तेव्हा रामाची काम इच्छा पाहण्यासाठी आलेली कामाक्षी देवी रूपात येथेच राहिली, असे वाल्मिकी रामायणात म्हटले आहे. कामाक्षी पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार पेशव्यांनी १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांच्या महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा पेशव्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षी देवीला सोन्या-चांदीचे अलंकार दिले, असा उल्लेख पेशवे बखरमध्ये मिळतो.
ह्युएनत्संग
कपिलधारा तीर्थावरून पुढे गेल्यावर कावनई गाव लागते. गावात जुनी घरे व
दोन लहानशे वाडेही पाहायला मिळतात. हनुमान व महादेवाचे मंदिर गावात आहेत.
आजूबाजूला पुरातन दगडी मूर्ती विखुरलेल्या पाहायला मिळतात. कावनई व
कपिलधारा परिसरात अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत.
राम मंदिरात ह्युएनत्संग
(ह्यु-एन-त्संग) या चिनी प्रवाशाने भेट दिलेली एक थाळीसारखी चिनी घंटा
आहे. ह्युएनत्संगने सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. ६२९ ते ६४५
या काळात भारताला भेट दिली होती. यात महाराष्ट्र-गुजरात या प्रवासादरम्यान
ह्युएनत्संग एका संख्याशास्त्राच्या विद्यापीठात आला होता. हे विद्यापीठ
कावनईत होते, असे अनेक संशोधक मानतात. दुसरा पुलकेशी चालुक्य व
ह्युएनत्संगची इ. स. ६४०मध्ये नाशिकमध्येच भेट झाली होती. ह्युएनत्संगने
पुलकेशीच्या वैभवाची व मराठ्यांच्या पराक्रमाची मुक्तकंठाने स्तुती केली
होती, असा उल्लेखही इतिहासाच्या पानांमध्ये सापडतो. या घटनेचा उल्लेख नाशिक
महापलिकेने प्रसिद्ध केलेल्या जीवनगंगा या स्मरणिकेतही आला आहे. यावेळी
ह्युएनत्संगने या कावनई येथील विद्यापीठाला दोन घंटा भेट दिल्या होत्या.
त्यातील एक घंटा दिल्लीतील पुरातत्व संग्रहात आहे. या घंटेवर कोरलेल्या
लिपीचा नेमका अर्थ काय व ह्युएनत्संगला काय म्हणायचे असेल, याबाबत संशोधन
होण्याची गरज आहे. ह्युएनत्संग नाशिकमध्ये आला तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा
भरला होता, असेही दिसते. कारण ह्युएनत्संगला बरेच साधू दिसल्याचे त्याने
नमूद केले आहे. सध्या कपिलमुनींच्या संख्याशास्त्राच्या गुरूकुलाचा काही
थांगपत्ता लागत नसला तरी ह्युएनत्संगने काही दिवस राहून या गावाला भेट
दिलेली घंटा अजूनही या गुरूकुलाचे महत्त्व व आकर्षण वाढवते. फक्त याचे
महत्त्व जाणून ह्युएनत्संगच्या या गावाला नक्की भेट द्यायला हवी.
लेखक : रमेश पडवळ
इमेल -rameshpadwal@gmail.com
संपर्क : 8380098107
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो.
कावनाई हे ठिकाण सिंहस्थ कुंभमेळा मूलस्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. तेथे महादेवाचे मंदिर आहे. ते तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्षें प्राचीन तीर्थस्थान आहे असे मानले जाते.
त्या वेळी त्या तीर्थावर प्रथम कुंभमेळा झाला, म्हणे. कावनाई येथे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो. तेथे पाण्याचे दोन कुंड आहेत. त्यांचे बांधकाम दगडी आहे. दोन्ही कुंडांना गोमुख आहे. गोमुखातून पाण्याची धार सतत चालू असते. गोमुखाची धार कधीही बंद पडलेली नाही, अशी स्थानिक धारणा आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते, असा भाविकांचा समज आहे.
कावनाई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर, श्री क्षेत्र कावनाई हे भारतातील चार शक्तिपीठांपैकी क्रमांक तीनचे शक्तिपीठ समजले जाते. अन्य तीन – १. कांचीपुरा, २. गुवाहाटी व ३. करंजगाव (शेगाव).
कावनाई क्षेत्राबाबत काही आख्यायिका प्रचलित आहेत. त्या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. त्या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असताना त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे त्या गावाचे नाव कावनाई असे पडले. त्या तीर्थावरच संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून जिवंत केले. समर्थ रामदासांनी तेथेच शिवाजी महाराजांना उपदेश दिला. तसेच, तेथे गजानन महाराजांनी बारा वर्षें तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले.
भविकांकडून कामाक्षी देवीच्या मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य सांगितले जाते. त्यानुसार, प्रभू रामचंद्र ज्या वेळेस श्री क्षेत्र टकेद येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले. त्या वेळेस कैलास पर्वतावर शंकराचा ‘श्रीराम’ हा जप सुरू असताना पार्वतीदेवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावर शंकर म्हणाले, की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. तेव्हा पार्वतीदेवी सीतारूपात श्रीरामाला मोहीत करू लागली. मात्र रामाने पार्वतीदेवीला ओळखून दंडवत घातले. तेव्हा पार्वतीदेवी प्रसन्न होऊन कैलास पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने ‘माझ्यासाठी आपण येथे राहवे’ असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वतीमाता येथे राहिली. श्रीरामाची ‘काम इच्छा’ बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे.
कावनाई गडाचे बांधकाम मुघलांकडून करण्यात आल्याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार १७५० ते १७६५ या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली तेव्हा त्यांनी नवसपूर्तीसाठी कामाक्षीदेवीला सोने-चांदीचे अलंकार दिले, ते मंदिराकडे उपलब्ध आहेत. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. त्यांचा उल्लेख पेशव्यांच्या बखरी मध्ये आहे.
श्री कावनाई क्षेत्राजवळ कावनाई गड आहे. ते ठिकाण प्रसिद्ध असून गिर्यारोहणासाठी सोपे व सहज सर करण्यासारखे आहे. कावनाई गावापासून गड चढण्यास सुरुवात करून गडाच्या सोंडेवरून वळण घेत घेत गडावर जाता येते. गड चढून गेल्यावर कड्याजवळ पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर कड्यात मोठा दरवाजा आहे. सुस्थित असलेल्या त्या दरवाजाजवळ छोटी गुहा आहे. त्यात चार-पाच व्यक्ती बसू शकतील. दरवाज्यातून छोट्या भुयारी मार्गाने कडा चढून गेल्यावर गडाचा प्रशस्त भाग आहे. पश्चिम भागात एक बुरूज आहे. तेथे पाण्याचे टाके व मंदिर असून टाक्याला उन्हाळ्यातही पाणी असते. त्याचे पाणी दुष्काळातही आटत नाही. गडावरून कळसूबाईची डोंगररांग, त्र्यंबक रांग, त्रिंगलवाडी असा परिसर दिसतो. गडावर भटकंती करून मन प्रसन्न होते. गडावरील निसर्गसौंदर्य मन मोहून टाकते.
‘श्री क्षेत्र कावनाई’ला नाशिक शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक महामार्गावरून घोटी-इगतपुरीच्या दिशेने जाताना खंबाळे गावाजवळ उजव्या हाताला फाटा फुटतो. तो कावनाई फाटा या नावाने ओळखला जातो. कावनाई गाव तेथून सात किलाेमीटर अंतरावर आहे. इगतपुरीहून कावनाई गावापर्यंतचे अंतर सतरा किलोमीटर आहे. गावात शिरल्यानंतर उजव्या हाताला कावनाई गड दिसतो. गडाची एक सोंड गावात उतरली आहे. गडावर राहण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला ‘कपिलाधारातिर्थ’ या आश्रमात राहण्याची सोय होऊ शकते.
– सीताराम आर. निकम







.jpg)






























.jpg)




































































































No comments:
Post a Comment