Wednesday, July 12, 2023

डुबेरगड

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात ठाणगाव- सिन्नर रस्त्यावर सिन्नरच्या अलीकडे ४ कि.मी.वर डूबेरा नावाचं गाव आहे. सिन्नरवरुन डुबेरला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला गाडी आहे, तसेच सिन्नर-ठाणगावकडे जाणर्या गाड्या डुबेर गावाच्या फाट्याला सोडतात. डुबेरे गावात जाण्यासाठी मुंबईहून घोटीमार्गे सिन्नरकडे जायचे. सिन्नरच्या थोडं अलीकडे उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावरून १३ कि.मी. आत डुबेरे गाव आहे. फाट्यावरुन आत वळाल्यावर शिवनदी व देवनदी या दोन नद्या ओलांडल्यावर गर्द झाडी लाग्ते. या झाडीतून आपल्याला डुबेरगडाचे दर्शन होते. डुबेरे हे गाव  छोटे पण टुमदार आहे. एका बाजूला औंढपट्टा डोंगराची रांग आहे व दुसऱ्या बाजूला एकच डोंगर ध्यानस्थ ऋषीसारखा बसलेला आहे. त्यावर गावकर्यां नी देवीचे छोटेसे मंदिर बांधलेले आहे. 
Dubera (Dubergad)

गावाला दोन प्रवेशद्वार असुन थोडीफार तटबंदी आहे. डुबेरगावात बर्वेंवाडा असून या वाड्यात थोरल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. गावाच्या मागेच माथ्यावर देवीचे देऊळ असणारा छोटा डुबेरगड दिसतो. डूबेरा गावात डुबेरगड देवीगड म्हणुन ओळखला जातो. गावापासून गडाचा पायथा अंदाजे एक कि.मी.वर आहे. गावातून गडाकडे जाताना परिसर रुक्ष भासतो. डुबेरगडाच्या पायथ्याशी जर्नादन स्वामींचा आश्रम आहे. आश्रमाजवळ  शंकराचे मंदिर असून जवळच पाण्याची विहीर असल्याने या मंदिरात निवासाची सोय होऊ शकते. नुकताच या मंदीराचा जीर्णोध्दार झाला आहे.  गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर असून वर जाण्यास सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. मंदीराबाहेर दोन भले मोठे वटवृक्ष पांथस्तांचे स्वागत करीत आहेत. 
उन्हात न संपणारी पायर्‍यांची वाट
  इथून गडाकडे जाताना बरेच मागे जावे लागते. एका चिंचोळ्या वाटेने आपण गडाच्या चढाईची सुरवात करतो. भावोकांच्या सोयीसाठी अलिकडेच या पायर्या बांधल्या आहेत, तसेच रेलिंगही बसवले आहे. या पायऱ्याच्या सुरवातीस एक छोटी घुमटी असुन त्यात सप्तशृंगी देवीची मुर्ती व तांदळा आहे. अवघ्या काही मिनीटात गडाच्या पश्चिमेकडच्या वळणावर आपण पोहचतो. इथे ठाणगाव पट्ट्यातील गिरीदुर्गांचे दर्शन आपल्याला होते. यात हाकेच्या अंतरावर दिसणारा आड किल्ला, सुळक्यावर उभा असलेला औंढा, पट्टा उर्फ विश्रामगड हे सर्व गड दिसतात. जवळपास पाचशे पायऱ्या चढून अर्ध्या तासात आपण डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो. गडाला कोणत्याही प्रकारची तटबंदी बांधली नाही, तसेच दरवाजाही दिसत नाही. कातळकडे असल्यामुळे तटबंदीची आवश्यकता पडली नसावी. 
      किल्ल्यावर एक मोठा तलाव, सप्तशृंगी देवीचं मंदिर, एक पडझड झालेली सिमेंटची इमारत आणि त्याच्यासमोर खालील बाजुस दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. हे पाणी देखील जानेवारी अखेरच असते. सप्तशॄंगी मातेच्या मंदीरासमोर एक छोटेखानी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या अगदी खालच्या भागावर नागाचे शिल्प आहे. मंदीरात दर पौर्णिमेला परिसरातील भाविक गर्दी करतात. 
डुबेरगडावर बंद पडलेल्या रडार सिस्टीमची इमारत

गडावर पिण्यास पाणी नसल्याने ते सोबत ठेवावे लागते. याशिवाय गडावर एक दर्गा असुन दोन ठिकाणी पादुकाशिल्प आहे. यातील एक शिल्प पावसाळी साचपाण्याच्या तलावात औदुंबराच्या झाडाखाली आहे. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. कधॉ काळी डुबेरे गावात सप्तशॄंगी मातेचा भक्त रहात असे. तो वर्षातून अनेकदा सप्तशॄंगी येथे पायी जात असे. मात्र त्याच्या वार्धक्याच्या का़ळात त्याला वणीला जाणे शक्य होत नव्हते. मग त्याने वणीच्या सप्तशॄंग मातेची प्रार्थना केली. देवीने त्याला स्वप्नात येऊन सांगितले कि तुझ्या गावातील डोंगरावर माझी पावले उमटतील. त्यांची पुजा कर. हिच ती पावले. विशेष म्हणजे या पावलांची दिशा सप्तशृंगी गडाच्या दिशेने आहेत. भक्ती आणि श्रध्दा यांचे हे अनोखे स्थान म्हणावे लागेल. देवीची मुर्ती देखील सप्तशॄंगी देवीची प्रतिकृतीच आहे.

    गडाच्या माथ्यावरून वायव्य दिशेला सप्तश्रुंगगड , मार्कंडेय, रावळ्या– जावळ्या हे जोड किल्ले दिसतात. तसेच सिन्नर शहर व तेथील औद्योगिक वसाहतीचे दृष्य दिसते. गडाच्या टोकावरुम म्हाळूंगी खोर्याचे दर्शन होते.  कोणत्याही ऋतूत डूबेरगडाला सहज भेट देता येते.
 पाण्याची टाकी डुबेरा गड

गडफेरी करायला अर्धा तास पुरेसा होतो. डूबेरगडाचा वापर केवळ टेहळणी करीता होत असावा.गडाचा इतिहासात फार उल्लेख नाही. शिवाजी महाराजांनी सिन्नर परिसरातील पट्टा व परिसरातील गड १६७०-७२ च्या दरम्यान ताब्यात घेतले. १६७९ साली जालन्याची लूट करून मराठी सैन्य परतत असताना मोगल सरदार रणमस्तखानाने त्यांची वाट अडवली. त्याच्या मागून सरदार केसरीसिंह यांची ज्यादा फौज चालून आल्याने खजिन्याची मोंगलांच्या तावडीतुन सुटका कशी करावी हा पेच पडला. त्यावेळी बहिर्जी नाईक याने अत्यंत शिताफीने ही सगळी फौज खजिन्यासकट डूबेरमार्गे पट्टा किल्ल्यावर नेली आणि मोगलांच्या हल्ल्यापासून मराठ्यांची आणि महाराजांची सुटका केली. पट्टा किल्ल्यावर जाताना महाराजांनी एक दिवस येथे मुक्काम केलं व राजे २२ नोव्हेंबर १६७९ रोजी पट्टागडावर गेले अशी माहिती स्थानिकाकडून सांगण्यात येते.
डुबेरगड, गडावरील सप्तशृंगी मातेचे देऊळ

पुढे औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत हे गड घेण्यासाठी मोगलांची धडपड सुरु होती. मात्र शिवकाळात या गडाला जितके महत्व नव्हते तितके पेशवाईत आले, कारण हिंदवी स्वराज्याची सीमा उत्तरेला नेउन भिडवणार्या चंड पराक्रमी पहिल्या बाजीराव पेशव्यांचे डुबेर गाव हे जन्मस्थान.            आता आपण याच जन्मस्थानाची म्हणजे बर्वे वाड्याची माहिती घेउया.थोरल्या बाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे येथील बर्वे वाड्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. थोरले बाजीराव हे राधाबाई व बाळाजी विश्वनाथ यांचे प्रथम संतान. बाळाजी विश्वनाथ भट हे स्वकर्तृत्वाने अनेक वर्षांच्या सेवेनंतर पेशवे पदावर पोचले. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदी नियुक्त केले. थोरले बाजीराव मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी आयुष्यभर यशस्वीपणे लढत राहिले. अवघे चाळीस वर्ष जीवन लाभलेल्या व उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या त्या धूर्त, पराक्रमी व मुत्सद्दी पेशव्याचा अंत, २८ एप्रील १७४० रोजी, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील, रावेरखेडी येथे उष्माघाताने झाला. त्यांचा अंत्यसंस्कार रावेरखेडी येथे करून त्यांची समाधी नर्मदेच्या काठावर बांधण्यात आली.

Bajirao Peshwa Birth place, Barve Wada , Dubera

     डूबेरा गाव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे आजोळ. या गावात बर्वेवाडा नावाचा सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा वाडा आहे. अजूनही सुस्थितीत असलेला १ बुरुज अन जाड तटभिंती असणारा हा वाडा म्हणजे मल्हार अंताजी बर्वे यांचा वाडा. हे मल्हार म्हणजे राधाबाईंचे सख्खे बंधू. मल्हार बर्वे यांना छत्रपती राजारामांकडून, गंगथडी प्रांतात चौदा महालांची चौथाई व जहागिरी मिळाली होती. पेशव्यांच्या पागेला चारा व खिल्लारे पुरवण्याचे काम बर्वे करत असत. पुढील काळात, त्यांनी निफाडजवळ कोहुरे व डुबेरे ही गावे वसवली.ताराराणींच्या कारकिर्दीत मल्हार अंताजी बर्वे यांना हे गाव इनाम सोपवले गेले व हे घराणे इथेच स्थायिक झाले. या भागात मोठ्या प्रमाणावर गवत वाढत असल्याने कुरणासाठी हि जागा योग्य होती. बर्वे घराण्यावर गाई बैलांची मोठ्या प्रमाणावर पैदास करून चांगल्या प्रतीचे बैल तोफांचे गाडे हाकण्याच्या कामी पाठवण्याची जबाबदारी होती. राधाबाईंचे माहेर कोकणात परंतु त्या गरोदर असताना पावसाळ्याचे दिवस होते. अशा वेळेस त्यांना माहेरी कोकणात पाठवण्याऐवजी घाटावर त्यांचे बंधू मल्हार यांच्या घरी प्रसूतीसाठी पाठवण्यात आले. याच वाड्यात राधाबाईंच्या पोटी पहिले पेशवे बाजीराव यांचा भाद्रपद महिन्यात सन १७०० मध्ये जन्म झाला. वाड्यातील ती खोली अन पलंग अजूनही सुस्थितीत आहेत. सध्या वाड्यात बर्वे घराण्याची अकरावी पिढी रहात आहे. 
पराक्रमी थोरले बाजीरावांचे जन्मस्थान - बर्वेवाडा

डुबेरे हे गाव सिन्नरच्या दक्षिणेला सात किलोमीटर अंतरावर आहे. एका बाजूला औंढा पट्टयांची रांग व दुस-या बाजूला सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेला डुबेर डोंगर. त्‍या डोंगर पायथ्याशी दाट झाडीत डुबलेले म्हणून गावाचे ‘डुबेरे हे नाव. त्या परिसरात अजूनही पेशवेकालीन बैठी व दुमजली घरे आहेत. गावाला दोन भव्य वेशी असुन पश्चिमेकडील वेशीजवळ पेशवेकालीन गणपतीची मुर्ती असलेले मंदीर आहे. डुबेरे गावातील मुख्य गल्ल्या व बोळ; अरुंद रस्ते एकमेकांना समांतर व काटकोनात छेदणारे आहेत, हे विशेष. बर्वेवाडा गावाच्या मध्यभागी आहे. तो १६९५ च्या आसपास बांधला गेला असावा. वाड्याचे बांधकाम भक्कम आहे. ते  चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगड यांनी केलेले आहे. चहुबाजूनी तटबंदी आहे. वाड्यास एक टेहळणी बुरुज आहे. त्या बुरुजावरुन गावाचा पूर्ण परिसर नजरेत भरतो. वाड्याच्या संरक्षणार्थ, गच्चीवरील अर्धगोलाकार मुंढा-यांच्या तळ भागातील जंग्याचा उपयोग शत्रूवर गोळ्या झाडण्यासाठी असे. मध्यंतरीच्या काळात पडझड झालेल्या भागाची डागडुजी चुकीच्या कार्यपद्धतीने झाल्याचे दाखले इमारतीवर ठिकठिकाणी दिसून येतात. त्यामुळे वाड्याच्या सौंदर्यास बाधा पोचली आहे. अशी दृष्ये संवेदनशील मनाला पटत नाहीत. पूर्वभिमुख असलेल्या बर्वेंवाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे होती पण यातील रस्त्याच्या बाजुला असणारे प्रवेशद्वार आता बुजविण्यात आले आहे. 

Entrance of Barve Wada

मुख्य रस्त्यावरुन पश्चिम दरवाज्याकडे जाताना सर्वप्रथम नजरेत भरतात त्या उत्तराभिमुख चिरेबंद भिंतीच्या खोबणीत चफकलतेने बसवलेल्या सलग रेषेतील सात खिडक्या. त्या विशिष्ट आकृतिबंधातील लाकडी खिडक्या ही बर्वे वाड्याची शान आहे! त्या जागेतून, युद्धावर निघालेल्या किंवा पराक्रम गाजवून परतणा-या स्वकुळातील पुरुषांवर किंवा अती महत्‍त्‍वाच्या पाहुण्यावर स्वागतपर पुष्पवृष्टी करण्याचा रिवाज असे. तसेच, पश्चिम दरवाज्यावरील नगारखान्यात वाद्यघोष वाजवून, लढाई जिंकून परतलेल्या शूर वीरांचे व पाहुण्याचे स्वागत करत असत.प्रवेशव्दाराच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. तटबंदीच्या आत चौसोपी दुमजली वाडा आहे . वाड्याच्या लाकडी खांबावर आणि हस्तांवर सुंदर नक्षीकाम आहे . पण वाड्याची निगा न राखल्याने त्याची रया गेलेली आहे .
वाड्याच्या आतील रचना भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित आहे. भारतीय वास्तुशास्त्रात खुल्या चौक रचनेला महत्त्व आहे. भौगोलिक दिशेचा उपयोग व तिन्ही ॠतूंत फायदेशीर ठरणा-या आणि निसर्गनियमांशी मिळत्याजुळत्या सुरक्षित जीवनशैलीला 'भारतीय वास्तुशास्त्र’ म्हणतात. महिला व मुले यांच्या स्वास्थ्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांची गरज असते हे ओळखून चौकांची मांडणी व आकार ठरवत असत. त्या रचनेमुळे सूर्यास्तापर्यंत घरात परिवर्तित मंद प्रकाश पडे व हवा खेळती राही. पूर्वेकडील प्रवेशद्वारातील आयताकृती चौकाला लागून तीन फूट उंच चिरेबंदी जोत्यावर, कर्मचा-यांसाठी कचेरी व बैठकीची व्यवस्था आहे. त्या जोत्यावर सम अंतरातील लाकडी खांबांचा सांगाडा व चौफुली आकाराच्या लाकडी तुळयांवर आधारित कौलारू छताची रचना साधली आहे. 

रखरखीत सूर्यप्रकाशाची प्रखरता कमी करण्यासाठी लाकडी जाळ्यांचा उपयोग केला आहे. मोठ्या चौकानंतर दोन लहान सम आकारातील चौकांपैकी एका चौकात तुळशी वृंदावन व दुस-यात पिण्याच्या पाण्याचे आड (छोट्या गोल आकाराची घडीव दगडात बांधलेली विहीर) आहे. चौकांवर माजघर, देवघर, स्वयंपाकघर व स्वच्छतागृहांचा प्रकाश निर्भरित आहे. वाड्याचा आराखडा फक्त सुरक्षिततेला महत्त्व देऊन बनवला आहे. देवघराचा दरवाजा, लाकडी तुळयांचे टोक व खांबावरील जुजबी नक्षीकाम सोडले तर कलासौंदर्याला फारसा वाव दिलेला दिसत नाही. तसेच, खोल्यांची उंची कमी का ठेवत याचाही खुलासा होत नाही.
वाड्यातील बहुतेक गोष्टी आजही सुस्थितीत असुन ४०० वर्षानंतर आजही वापरात आहेत. लाकडी खांबांवरचे नक्षीकाम फार सुंदर आहे. भिंतींमध्ये धान्य साठवण्याचे कोठार तसेच जमीनीत तळघरे आहेत.
युद्धकाळ किंवा अडीअडचणीच्या वेळी, धान्यसाठा मुबलक असावा यासाठी वाड्यात बळंद (दोन भिंतीतील पोकळी) व इतर खोल्यांची रचना केली आहे. बळंदात उतरण्यासाठी लाकडी ओंडक्यांची व्यवस्था आहे. तेथे परिवर्तित सूर्यप्रकाश व शुद्ध खेळती हवा राहील असे नियोजन आहे. तळमजल्यावरील भिंतीत केलेल्या पोकळीची लाकडी झडप वर ओढून हवे तेवढेच धान्य काढता येई. पडवी ते माजघर मार्गावरील भिंतीच्या रुंद गाभ्यातील अरुंद जिन्याची रचना अपरिचित माणसास चटकन दिसू नये अशी आहे. चार ते पाच फूट रुंद भिंतीच्या गाभ्यात सामानासाठी फडताळे व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी गुप्त कोनाडे आहेत. रात्रप्रकाशदिव्यांसाठी ठिकठिकाणी छोटे कोनाडे व वस्तू अडकवण्यासाठी लाकडी खुट्यांचा वापर आढळतो.

बाळंत स्त्रीस आवश्यक असणा-या, थंड व उबदार खोलीची रचना वास्तुशास्त्रास धरुन आहे. त्या खोलीतील खिडक्यांची रचना जरुरीपुरता सूर्यप्रकाश, शुद्ध हवा व गरम हवेचे संतुलन राहील अशी आहे. अवघडलेल्या बाळांत स्त्रीस, अंघोळ घालण्यासाठी केलेल्या रचनेतील वेगळेपण समजावल्याशिवाय कळत नाही! परस्थ स्त्रियांना, बाह्य दरवाजातून आत घेण्यासाठीची सूचकता व वरील रचनेतील सर्व खुबी पाहून नवल वाटते! त्यावरुन, वर्तमान आधुनिक जीवनपद्धतीतील कृत्रिमपणा भारतीय जीवनशैलीशी किती फारकत घेणारा आहे हे दिसून येते! त्यामुळेच, शहरात तोकड्या सदनिकेत ‘न मिळणारे वास्तुसुख शोधणा-यांची संख्याच अधिक आहे;

साधारण दोन एकर जमिनीवरील तटबंदीचा जोत्यापर्यंतच्या भाग दगडात व त्यावरचा भाग मातीचा आहे. विशिष्ट पद्धतीने कमावलेल्या त्या मातीचे कुतूहल सर्वांनाच असते. मातीची संलग्नता व क्षमता वाढवण्यासाठी खापरी तुकडे, घोड्याची लीद, शंख-शिंपल्याचा चुरा, छोटे गोटे व विशिष्ट वनस्पतींच्या रसाचे म़िश्रण एकजीव होईपर्यंत बैलांकडून तुडवून, अनेक दिवस थंड वातावरणात भिजत ठेवत. ओल्या मातीचे घट्ट ढेकळ एकमेकांवर रचून भिंत बांधली जात असे. वाड्याच्या दक्षिण भागात घोड्यांच्या पागा व जनावरांचे गोठे आहेत.
 वाड्यात एक विहीर असून त्या शेजारीच घोड्यांची पागा असायची. वाड्यात काही वर्षांपूर्वी गावातील शाळा भरत असे पण जागा अपुरी पडल्याने ती दुसरीकडे स्थलांतरित झाली. 

पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून जपलेल्या मोजक्या शस्त्रसंग्रहात ढाल, तलवार, भाला, चिलखत इत्यादी वस्तू आहेत. त्या संग्रहातील घोड्यावर बसून भालाफेक करणारे बाजीराव पेशव्यांचे फॅब्रिक पेंटिग खूपच बोलके आहे. जीवनात अनेक प्रसंगात साथ देणारा माजघरातील मजबूत झोपाळा खूप काही सांगून जातो! इतिहासकार कै. सेतुमाधव पगडी, म.श्री दिक्षीत, ना स. इनामदार, रणजीत देसाई आदी मान्यवरांनी वाड्यास भेट दिली आहे.दिल्ली पर्यंत धडक मारणाऱ्या बाजीराव पेशव्यांच्या जन्मस्थानाची अवस्था पाहून मन विषण्ण होते .

डुबेरे गावची प्राक्तनरेषा – सटवाई!

डुबेरे गावाला निसर्गाने सौंदर्य मुक्त हस्ताने दिले आहे. गाव दाट झाडीत वसलेले आहे; आंबराया, चिंचेची बने, बोरी-बाभळी यांनी गाव व्यापून टाकलेले आहे. गावाला काटेरी झाडांचे भक्कम कुंपण आहे. डुबेरे गावाची ओळख थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मगाव म्हणून आहे.गावाचे नाव डुबेरे का पडले? लोक मजेदार आख्यायिका सांगतात. गाव गर्द झाडीत डुबलेले असल्यामुळेच डुबेलऽ ऽ  डुबेलचे ‘डुबेर’ झाले. गावाला पूर्वी भक्कम तटबंदी होती. गावाला दोन वेशी आहेत. गावातील घरांची रचना सुडौल आहे. रस्ते व गल्ल्या एकमेकांना काटकोनात छेदतात. ते गाव अंताजी बर्वे यांनी तीनशे वर्षांपूर्वी वसवले असे मानले जाते. गाव डोंगरात असल्याने गवताची राने आहेत.
    गावात वाजे, ढोली, वारुंगसे, माळी हे आडनाव धारण करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोण कोठून येऊन कधी स्थायिक झाले त्याचा पुरावा उपलब्ध नाही. वाजे हे कुटुंब बर्वे यांच्याबरोबरच डुबेरे येथे आल्याचे समजले जाते. वाजे हे पूर्वीचे शिर्के होते. संभाजी महाराजांनी शिर्के यांचे शिरकाण केले. त्या भयापोटी पुण्यातील शिर्के मंडळी डोंगराचा आश्रय घेत सिन्नर तालुक्यातील डुबेरे, पांढुर्ली येथे स्थायिक झाल्याचे दिसून येते.
    गावात ऐतिहासिक सप्तश्रृंगीगड, भैरवनाथ मंदिर, सटवाई (सटुआई) माता यांची मंदिरे आहेत. गावाची लोकसंख्या जेमतेम सात हजार इतकी आहे. गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती व्यवसायाशी निगडित राहून गुण्यागोविंदाने नांदणारी कुळवाडी, बारा बलुतेदार समाज तेथे स्थिरावला आहे. विडी व्यवसाय हा शेतीपूरक व जगण्याचा एकमेव आधार म्हणून ओळखला जाऊ लागला. डुबेरे गावात धनगर समाजाचे लोक घोंगड्या विणण्याचा व्यवसाय करत असत. गावाची लोकसंख्या वाढत गेली. शिवार मात्र तेवढाच राहिला. शेतीचा हिशोब एकरावरून बिघा व आता पांड (गुंठा) या भाषेत होऊ लागला. गावाला बगल देऊन खळखळ वाहणारी ढोकी नदी आहे. गावची रचना नगररचना केल्यासारखी आहे. इतिहासकालीन पेशवेवाडा, दक्षिणोत्तर राजेशाही, प्रवेशद्वार टेहळणीसाठी बुरुज, बसण्यासाठी चौकांची रचना आहे. भाजी मंडई व जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ आरोग्य सुविधांनी युक्त आहे. 
_DubereGavachi_Pratankanresha_satvai_1_1.jpg
    महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी सटवाईची मंदिरे दिसून येतात. डुबेरे हे त्यांपैकी एक. सटवाई ही मूल जन्माला आल्यानंतर त्याचे भविष्य लिहिते असा (अंध) समज आहे. सटवाई ही ब्रह्मदेवाची मुलगी मानली जाते. तिच्या मांडीवर बाळ आहे. बर्वे यांनी सटवाई मंदिर बांधले व ताम्रपट करून भट यांना मंदिराचे पुजारी म्हणून परंपरेने नेमले आहे. देवीच्या मंदिरात शेंदूर लावलेल्या दोन पाषाणमूर्ती आहेत. बाळाचे नशीब त्याचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी लिहिणारी देवता म्हणजे सटवाई व बाळाच्या आरोग्याची काळजी घेणारी देवता म्हणजे जीवती. मात्र सटवाई व जीवती या दोन बहिणींचे आपापसात कधीच पटत नसल्यामुळे त्यांचे भाविकसुद्धा परस्परविरोधी देवतांना जात नाहीत.
_DubereGavachi_Pratankanresha_satvai_2.jpg
   सटवाई मंदिराची यात्रा भरवली जात नाही. कारण गावाला दोन रस्ते असतील तरच म्हणे यात्रा भरवली जाते! जहागीरदार बर्वे विश्वस्त म्हणून मंदिराचे काम बघत असत. परंतु ‘सटवाई मंदिर ट्रस्ट’ची स्थापना१९८७ साली झाली. पूर्वीचे जुनाट मंदिर पाडून नवे बांधले गेले. त्यात अद्ययावत मंदिर, गर्भगृह, सभामंडप, पाणपोई इत्यादी सुविधा आहेत. भक्तनिवासाची सोय आहे. हरीभक्त परायण त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. देवी मंदिराच्या सभागृहात पंचधातूच्या काल्पनिक श्री सटवाई देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एप्रिल २००१ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी झाली. महामंडलेश्वर आचार्य महंत रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे मार्गदर्शन त्याकरता लाभले.मानववंश शास्त्रात संशोधन करणारी फ्रान्सची जेसिका हेकीट ही अभ्यासक सटवाईची परंपरा जाणून घेण्यासाठी डुबेरे येथे येऊन गेली. तिने गावात तीन आठवडे राहून सटवाईचा अभ्यास केला.
        डुबेरे गावातील भोपळा वृक्ष हे झाड प्रसिद्ध आहे. ते झाड सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर डुबेरे येथील बुद्धमंदिराजवळ ढोकी नदीच्या काठी आहे. ते हरी काळू रुपवते यांच्या मालकीच्या जागेत आहे. डुबेरे गावातील जैन मंदिरासमोरून डोकी नाल्याकडे जाणारा रस्ता आपल्याला भोपळ्याच्या झाडाकडे घेऊन जातो. भोपळ्याचे झाड डुबेरेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या झाडाखाली एक समाधीही आहे. ती कोणाची अन् हे झाड डुबेरेत कोठून आले, असा प्रश्न अनेकांना पडतो. हे झाड सिग्नोनियेसी फॅमिलीतील भोपळा सदृष्य प्रकार आहे. याचे वय साधारण शंभर वर्ष असावे. याचे शास्त्रीय नाव क्रिसेन्शीया कुजेटा असे असून, सर्वसाधारण नाव बेगर्स बाऊल अथवा कॅलॅबॅश ट्री असे आहे. या फळापासून भिक्षेचा कटोरा व एकतारीचा तुंबा बनविला जातो. भारतात अन्यत्रही हे झाड आढळते. वृक्षाला जुलै-ऑगस्ट महिन्यांत बुंधा, खोड, फांद्या व सर्वत्र फुले येतात आणि  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गोल भोपळे लागतात. झाड कसे आले? कोणी लावले? त्यांचे वय किती? यांविषयी माहिती उपलब्ध नाही. गोपाळा कबीर नावाच्या साधूने ते झाड लावले असे मानले जाते.  हे झाड येथे कोठून आले याबाबत एक अख्यायिका सांगितली जाते. या झाडाखाली असलेली समाधी गोपाळा फकीरा या व्यक्तीची आहे. हा व्यक्ती एका इंग्रज अधिकाऱ्याकडे कामाला होता. तो इंग्रज अधिकारी भारत सोडून जात असताना त्याने फकीराला विचारले की, ‘तुला काय हवे आहे.’ तेव्हा फकीराने ‘तुमचा देश पाहायचा आहे’, अशी इच्छा व्यक्त केली. ही इच्छा त्या इंग्रज अधिकाऱ्याने पूर्ण केली व फकिरा मायदेशी परतताना भेट म्हणून त्याला या झाडाचे रोप दिले. तेव्हापासून हे झाड येथे आहे. या झाडाच्या फळाला बी नसते त्यामुळे डुबेरेत हे एकमेव झाड आहे. ते भोपळ्याचे झाड फकिराच्या समाधीची साथ देत आपल्या अंगाखांद्यावर उमलणारी फुले त्या समाधीवर शिंपडताना दिसते.
ग्रामपंचायतीने झाडाच्या रक्षणासाठी बुंध्याजवळ संरक्षक ओटा बांधला आहे. झाडाची फळे खाण्यासाठी वापरत नाहीत. त्यापासून विणा, एकतारी बनवतात. वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक प्र.के. घाणेकर यांनी डुबेरे येथे भेट दिली. त्यांनी सांगितले, की त्या झाडाचे शास्त्रीय नाव ‘क्रिसेन्शीया कुजेटा’ असे आहे. त्याला इंग्रजीत ‘बेगर्स बाऊल’ किंवा ‘कॅलॅबश ट्री’ व हिंदीमध्ये विलायती बेल असे म्हणतात. तो छोटा वृक्ष मूळचा विषुववृत्तीय दक्षिण अमेरिकेमधील आहे. त्याच्या बियांपासून तेल काढतात. ते झाड ब्रिगेनिएसी या कुळातील आहे. ती झाडे मुंबईतील राणीचा बाग; तसेच, पुण्यातील बी.एम.सी.सी. कॉलेज, गोखले अर्कशाळा परिसर या ठिकाणी आहेत. भोपळ्याचे वेल असतात. तसेच त्याचे फूल एकलिंगी असते. त्यामुळे भोपळीवेल व भोपळीसदृश्य असलेल्या डुबेरे येथील या झाडाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. एक वेगळे, दुर्मीळ झाड बघण्यासाठी पर्यटक मात्र तेथे येत असतात.    डुबेरे गावातील भोपळा वृक्ष हे झाड प्रसिद्ध आहे. ते झाड सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर डुबेरे येथील बुद्धमंदिराजवळ ढोकी नदीच्या काठी आहे. ते हरी काळू रुपवते यांच्या मालकीच्या जागेत आहे. डुबेरे गावातील जैन मंदिरासमोरून डोकी नाल्याकडे जाणारा रस्ता आपल्याला भोपळ्याच्या झाडाकडे घेऊन जातो. भोपळ्याचे झाड डुबेरेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या झाडाखाली एक समाधीही आहे. ती कोणाची अन् हे झाड डुबेरेत कोठून आले, असा प्रश्न अनेकांना पडतो. हे झाड सिग्नोनियेसी फॅमिलीतील भोपळा सदृष्य प्रकार आहे. याचे वय साधारण शंभर वर्ष असावे. याचे शास्त्रीय नाव क्रिसेन्शीया कुजेटा असे असून, सर्वसाधारण नाव बेगर्स बाऊल अथवा कॅलॅबॅश ट्री असे आहे. या फळापासून भिक्षेचा कटोरा व एकतारीचा तुंबा बनविला जातो. भारतात अन्यत्रही हे झाड आढळते. वृक्षाला जुलै-ऑगस्ट महिन्यांत बुंधा, खोड, फांद्या व सर्वत्र फुले येतात आणि  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गोल भोपळे लागतात. झाड कसे आले? कोणी लावले? त्यांचे वय किती? यांविषयी माहिती उपलब्ध नाही. गोपाळा कबीर नावाच्या साधूने ते झाड लावले असे मानले जाते.  हे झाड येथे कोठून आले याबाबत एक अख्यायिका सांगितली जाते. या झाडाखाली असलेली समाधी गोपाळा फकीरा या व्यक्तीची आहे. हा व्यक्ती एका इंग्रज अधिकाऱ्याकडे कामाला होता. तो इंग्रज अधिकारी भारत सोडून जात असताना त्याने फकीराला विचारले की, ‘तुला काय हवे आहे.’ तेव्हा फकीराने ‘तुमचा देश पाहायचा आहे’, अशी इच्छा व्यक्त केली. ही इच्छा त्या इंग्रज अधिकाऱ्याने पूर्ण केली व फकिरा मायदेशी परतताना भेट म्हणून त्याला या झाडाचे रोप दिले. तेव्हापासून हे झाड येथे आहे. या झाडाच्या फळाला बी नसते त्यामुळे डुबेरेत हे एकमेव झाड आहे. ते भोपळ्याचे झाड फकिराच्या समाधीची साथ देत आपल्या अंगाखांद्यावर उमलणारी फुले त्या समाधीवर शिंपडताना दिसते.
ग्रामपंचायतीने झाडाच्या रक्षणासाठी बुंध्याजवळ संरक्षक ओटा बांधला आहे. झाडाची फळे खाण्यासाठी वापरत नाहीत. त्यापासून विणा, एकतारी बनवतात. वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक प्र.के. घाणेकर यांनी डुबेरे येथे भेट दिली. त्यांनी सांगितले, की त्या झाडाचे शास्त्रीय नाव ‘क्रिसेन्शीया कुजेटा’ असे आहे. त्याला इंग्रजीत ‘बेगर्स बाऊल’ किंवा ‘कॅलॅबश ट्री’ व हिंदीमध्ये विलायती बेल असे म्हणतात. तो छोटा वृक्ष मूळचा विषुववृत्तीय दक्षिण अमेरिकेमधील आहे. त्याच्या बियांपासून तेल काढतात. ते झाड ब्रिगेनिएसी या कुळातील आहे. ती झाडे मुंबईतील राणीचा बाग; तसेच, पुण्यातील बी.एम.सी.सी. कॉलेज, गोखले अर्कशाळा परिसर या ठिकाणी आहेत. भोपळ्याचे वेल असतात. तसेच त्याचे फूल एकलिंगी असते. त्यामुळे भोपळीवेल व भोपळीसदृश्य असलेल्या डुबेरे येथील या झाडाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. एक वेगळे, दुर्मीळ झाड बघण्यासाठी पर्यटक मात्र तेथे येत असतात.
भैरवनाथ मंदिर हे डुबेरे येथील ग्रामदैवत आहे. ते गावाच्या पश्चिम दिशेला आहे. भैरवनाथ मंदिराची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरवली जाते. भैरवनाथाची काठी माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी दांडी पौर्णिमेला गावभर मिरवली जाते. त्या काठीची पूजा चैत्र पौर्णिमेपर्यंत करतात. भैरवनाथ यात्रेच्या दिवशी रात्रभर जागरण-गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. एखाद्या मनुष्यास, प्राण्यास सर्पदंश झाला तर त्याला त्या मंदिरात तीन-चार दिवस ठेवतात व त्यानंतर सत्यनारायणाची पूजा करून किंवा साधा गुळ-खोबऱ्याचा प्रसाद तेथे तयार करून तो देतात. त्या मनुष्याला नवे कपडे परिधान करून त्यानंतर वाजत-गाजत गावातील सर्व देवतांचे दर्शन करतात. मंदिर पूर्वी छोट्या स्वरूपाचे होते. गावातील सर्व लोकांनी मिळून त्याचे भक्कम स्वरूपाचे मंदिर बांधले आहे. मंदिरात भैरवनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते डुबेरेगड म्हणून ओळखले जाते. डुबेरेगडावर सप्तश्रृंगी देवीचे मंदिर बांधले आहे. त्या ठिकाणी नवरात्र उत्सवात यात्रा भरवली जाते. गडाच्या पायथ्याशी अमरगिरी महाराजांचा शांतिगिरी आश्रम आहे व नागेश्वराचे मंदिर आहे. नागेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरवली जाते.

संदर्भ :-

१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्ग या दिवाळी अंकातील श्री.कैलास रसाळ, श्री चंद्रशेखर बर्वे यांचे लिखाण'
३) https://www.thinkmaharashtra.com मोहिनी माळी यांचे लिखाण
४) दुर्गभ्रमंती नाशिकची- अमित बोरोले
५) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
६) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
७)  http://invisiblepranav.blogspot.com, 
८) www. trekshitiz.com हि वेबसाईट
९) www.durgbharari.in हि वेबसाईट
 
डुबेर गावाच्या अलिकडूनच एक रस्ता खदाणीच्या मार्गे गडाकडे जातो त्या मार्गे आम्ही गड पायथ्याला पोहोचलो व नागेश्वर मंदिरासमोर आम्ही गाडी पार्क करून वेळ न दवडता गडावर चढाई सुरू केली. गडावर जाण्यासाठी संपूर्णतः पायऱ्या केलेल्या आहेत.पायऱ्या मार्ग संपल्यानंतर खालच्या बाजूस दोन मोठे टाके आहेत तिथून पुढे आलो की सप्तशृंगी मातेचे मंदिर लागते.मंदिराच्या थोडे पुढे जाऊन समोरील परिसर पाहून आम्ही परत मंदिराकडे आलो तिथून उजव्या बाजूस एक छोटेखानी मंदिर लागते त्यात दगडी पादुकांची शिळा आहे.तिथून पुढे आले की एक पिराचे ठिकाण लागते.तिथे थडगेवजा चौथऱ्यावर काही चादरी अंथरलेल्या दिसल्या ते बघून आम्ही थोडे पुढे आलो. तिथे एक कोरडा पडलेला, बऱ्यापैकी मोठा असलेला तलाव आहे.तो बघून आम्ही लगेच तलावाच्या डाव्या बाजूने उतरणीच्या मार्गाला लागलो. दहा ते पंधरा मिनिटात आम्ही साधारण एक वाजेच्या दरम्यान गड पायथ्याला आलो व तेथील नागेश्वर मंदिर,हनुमान मंदिर वैगरे बघून लगेचच गाडीला किक मारली व आता पुढील लक्ष्य होते ते म्हणजे खतरनाक असा औंढा

  http://invisiblepranav.blogspot.com/2016/08/blog-post.html

 या पवनचक्कयामुळे गाडी रास्ता व्यवस्थित होता,पुन्हा ठाणगावचा रस्ता गाडीने घेतला आणि ६ वाजता डुबेरवाडीतल्या बर्वेवाड्यात थांबलो. डुबेरवाडी म्हणजे पराक्रमी थोरले बाजीरावांचे जन्मगाव.या डुबेरवाडीतल्या बर्वे घराण्यातील मुलीचे बाळाजी विश्वनाथांसोबत लग्न झाले आणि तिच्या पोटी थोरले बाजीराव जन्मले ते या बर्वेवाड्यात, वाड्यात पोहचलो तेव्हा त्यांचे वंशज तिथे नव्हते.. त्यामुळे बाजीरावच्या जन्माची खोली बघायला मिळाली नाही, सुदंर कलाकुसर असलेल्या या ऐतिहासिक वाड्याचे फोटो काढून आम्ही सिन्नरला मुक्कामासाठी परतलो.

दुसरा दिवस

सकाळी सगळे लवकर उठलो आणि नाश्ता करून तडक गाडी डुबेरगडाकडे पळवली आणि डुबेरगडाच्या पायथ्याला असलेल्या नागेश्वर मंदिराकडे थांबवली, गडावर सप्तशृंगी मातेचे देऊळ असल्याने गडावर जायला व्यवस्थित पायऱ्या आहेत...गडावर आपण अवघ्या 20 मिनिटात पोहचतो, उजव्याबाजूला दोन पाण्याची टाक्या दिसतील आणि समोर सप्तशृंगी देवीचे मंदिर दिसेल, मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आम्ही बाकीचा गड बघायला निघालो, एकेठिकाणी गणपतीचे लहानसे मंदिर बांधले होते... नेहमीप्रमाणे इथेही काही पीर बाबाचे बांधकाम केलेलं होतेच, पुढे पावसाळी तलाव नावाप्रमाणे सुकलेला होता.. अजून कुठे गडाचे अवशेष दिसले नाही म्हणून गड उतरायला सुरवात केली आणि 10 मिनिटात खाली आलो.. आम्हाला एवढ्या लवकर आलेलो बघून असीम सुद्धा चाट पडला, मुळात गडावर जास्त अवशेष नसल्याने गड लवकर बघून झाला होता. हेमेश आणि कुणाल सकाळची राहलेली कामे करायला झुडुपात गडप झालेत, मी सुद्धा तेवढा वेळ मंदिरात काढायचा विचार केला.. तेवढी 10 मिनिटे शांतता अनुभवल्यावर मी वेगळ्याच विश्वात गेलो होतो आणि त्यात खंड पाडला तो प्रसादच्या आवाजाने' "प्रणव, चल निकलते है", नाईलाजाने मी निघालो.

डुबेरे गावचा बर्वे वाडा - बाजीरावाचे जन्‍मस्‍थान

थोरल्या बाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे येथील बर्वे वाड्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. थोरले बाजीराव हे राधाबाई व बाळाजी विश्वनाथ यांचे प्रथम संतान. बाळाजी विश्वनाथ भट हे स्वकर्तृत्वाने अनेक वर्षांच्या सेवेनंतर पेशवे पदावर पोचले.

मल्हार बर्वे यांना छत्रपती राजारामांकडून, गंगथडी प्रांतात चौदा महालांची चौथाई व जहागिरी मिळाली होती. पेशव्यांच्या पागेला चारा व खिल्लारे पुरवण्याचे काम बर्वे करत असत. पुढील काळात, त्यांनी निफाडजवळ कोहुरे व डुबेरे ही गावे वसवली. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदी नियुक्त केले. थोरले बाजीराव मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी आयुष्यभर यशस्वीपणे लढत राहिले. अवघे चाळीस वर्ष जीवन लाभलेल्या व उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या त्या धूर्त, पराक्रमी व मुत्सद्दी पेशव्याचा अंत, २८ एप्रील १७४० रोजी, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील, रावेरखेडी येथे उष्माघाताने झाला. त्यांचा अंत्यसंस्कार रावेरखेडी येथे करून त्यांची समाधी नर्मदेच्या काठावर बांधण्यात आली.

डुबेरे हे गाव सिन्नरच्या दक्षिणेला सात किलोमीटर अंतरावर आहे. एका बाजूला औंढा पट्टयांची रांग व दुस-या बाजूला सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेला डुबेर डोंगर. त्‍या डोंगर पायथ्याशी दाट झाडीत डुबलेले म्हणून गावाचे ‘डुबेरे हे नाव. त्या परिसरात अजूनही पेशवेकालीन बैठी व दुमजली घरे आहेत. डुबेरे गावातील मुख्य गल्ल्या व बोळ; अरुंद रस्ते एकमेकांना समांतर व काटकोनात छेदणारे आहेत, हे विशेष. बर्वेवाडा गावाच्या मध्यभागी आहे. तो १६९५ च्या आसपास बांधला गेला असावा. वाड्याचे बांधकाम भक्कम आहे. ते  चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगड यांनी केलेले आहे. चहुबाजूनी तटबंदी आहे. वाड्यास एक टेहळणी बुरुज आहे. त्या बुरुजावरुन गावाचा पूर्ण परिसर नजरेत भरतो. वाड्याच्या संरक्षणार्थ, गच्चीवरील अर्धगोलाकार मुंढा-यांच्या तळ भागातील जंग्याचा उपयोग शत्रूवर गोळ्या झाडण्यासाठी असे. मध्यंतरीच्या काळात पडझड झालेल्या भागाची डागडुजी चुकीच्या कार्यपद्धतीने झाल्याचे दाखले इमारतीवर ठिकठिकाणी दिसून येतात. त्यामुळे वाड्याच्या सौंदर्यास बाधा पोचली आहे. अशी दृष्ये संवेदनशील मनाला पटत नाहीत.

मुख्य रस्त्यावरुन पश्चिम दरवाज्याकडे जाताना सर्वप्रथम नजरेत भरतात त्या उत्तराभिमुख चिरेबंद भिंतीच्या खोबणीत चफकलतेने बसवलेल्या सलग रेषेतील सात खिडक्या. त्या विशिष्ट आकृतिबंधातील लाकडी खिडक्या ही बर्वे वाड्याची शान आहे! त्या जागेतून, युद्धावर निघालेल्या किंवा पराक्रम गाजवून परतणा-या स्वकुळातील पुरुषांवर किंवा अती महत्‍त्‍वाच्या पाहुण्यावर स्वागतपर पुष्पवृष्टी करण्याचा रिवाज असे. तसेच, पश्चिम दरवाज्यावरील नगारखान्यात वाद्यघोष वाजवून, लढाई जिंकून परतलेल्या शूर वीरांचे व पाहुण्याचे स्वागत करत असत.

वाड्याच्या आतील रचना भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित आहे. भारतीय वास्तुशास्त्रात खुल्या चौक रचनेला महत्त्व आहे. भौगोलिक दिशेचा उपयोग व तिन्ही ॠतूंत फायदेशीर ठरणा-या आणि निसर्गनियमांशी मिळत्याजुळत्या सुरक्षित जीवनशैलीला 'भारतीय वास्तुशास्त्र’ म्हणतात. महिला व मुले यांच्या स्वास्थ्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांची गरज असते हे ओळखून चौकांची मांडणी व आकार ठरवत असत. त्या रचनेमुळे सूर्यास्तापर्यंत घरात परिवर्तित मंद प्रकाश पडे व हवा खेळती राही. पूर्वेकडील प्रवेशद्वारातील आयताकृती चौकाला लागून तीन फूट उंच चिरेबंदी जोत्यावर, कर्मचा-यांसाठी कचेरी व बैठकीची व्यवस्था आहे. त्या जोत्यावर सम अंतरातील लाकडी खांबांचा सांगाडा व चौफुली आकाराच्या लाकडी तुळयांवर आधारित कौलारू छताची रचना साधली आहे. रखरखीत सूर्यप्रकाशाची प्रखरता कमी करण्यासाठी लाकडी जाळ्यांचा उपयोग केला आहे. मोठ्या चौकानंतर दोन लहान सम आकारातील चौकांपैकी एका चौकात तुळशी वृंदावन व दुस-यात पिण्याच्या पाण्याचे आड (छोट्या गोल आकाराची घडीव दगडात बांधलेली विहीर) आहे. चौकांवर माजघर, देवघर, स्वयंपाकघर व स्वच्छतागृहांचा प्रकाश निर्भरित आहे. वाड्याचा आराखडा फक्त सुरक्षिततेला महत्त्व देऊन बनवला आहे. देवघराचा दरवाजा, लाकडी तुळयांचे टोक व खांबावरील जुजबी नक्षीकाम सोडले तर कलासौंदर्याला फारसा वाव दिलेला दिसत नाही. तसेच, खोल्यांची उंची कमी का ठेवत याचाही खुलासा होत नाही.

युद्धकाळ किंवा अडीअडचणीच्या वेळी, धान्यसाठा मुबलक असावा यासाठी वाड्यात बळंद (दोन भिंतीतील पोकळी) व इतर खोल्यांची रचना केली आहे. बळंदात उतरण्यासाठी लाकडी ओंडक्यांची व्यवस्था आहे. तेथे परिवर्तित सूर्यप्रकाश व शुद्ध खेळती हवा राहील असे नियोजन आहे. तळमजल्यावरील भिंतीत केलेल्या पोकळीची लाकडी झडप वर ओढून हवे तेवढेच धान्य काढता येई. पडवी ते माजघर मार्गावरील भिंतीच्या रुंद गाभ्यातील अरुंद जिन्याची रचना अपरिचित माणसास चटकन दिसू नये अशी आहे. चार ते पाच फूट रुंद भिंतीच्या गाभ्यात सामानासाठी फडताळे व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी गुप्त कोनाडे आहेत. रात्रप्रकाशदिव्यांसाठी ठिकठिकाणी छोटे कोनाडे व वस्तू अडकवण्यासाठी लाकडी खुट्यांचा वापर आढळतो.

बाळंत स्त्रीस आवश्यक असणा-या, थंड व उबदार खोलीची रचना वास्तुशास्त्रास धरुन आहे. त्या खोलीतील खिडक्यांची रचना जरुरीपुरता सूर्यप्रकाश, शुद्ध हवा व गरम हवेचे संतुलन राहील अशी आहे. अवघडलेल्या बाळांत स्त्रीस, अंघोळ घालण्यासाठी केलेल्या रचनेतील वेगळेपण समजावल्याशिवाय कळत नाही! परस्थ स्त्रियांना, बाह्य दरवाजातून आत घेण्यासाठीची सूचकता व वरील रचनेतील सर्व खुबी पाहून नवल वाटते! त्यावरुन, वर्तमान आधुनिक जीवनपद्धतीतील कृत्रिमपणा भारतीय जीवनशैलीशी किती फारकत घेणारा आहे हे दिसून येते! त्यामुळेच, शहरात तोकड्या सदनिकेत ‘न मिळणारे वास्तुसुख शोधणा-यांची संख्याच अधिक आहे;
 
साधारण दोन एकर जमिनीवरील तटबंदीचा जोत्यापर्यंतच्या भाग दगडात व त्यावरचा भाग मातीचा आहे. विशिष्ट पद्धतीने कमावलेल्या त्या मातीचे कुतूहल सर्वांनाच असते. मातीची संलग्नता व क्षमता वाढवण्यासाठी खापरी तुकडे, घोड्याची लीद, शंख-शिंपल्याचा चुरा, छोटे गोटे व विशिष्ट वनस्पतींच्या रसाचे म़िश्रण एकजीव होईपर्यंत बैलांकडून तुडवून, अनेक दिवस थंड वातावरणात भिजत ठेवत. ओल्या मातीचे घट्ट ढेकळ एकमेकांवर रचून भिंत बांधली जात असे. वाड्याच्या दक्षिण भागात घोड्यांच्या पागा व जनावरांचे गोठे आहेत.

पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून जपलेल्या मोजक्या शस्त्रसंग्रहात ढाल, तलवार, भाला, चिलखत इत्यादी वस्तू आहेत. त्या संग्रहातील घोड्यावर बसून भालाफेक करणारे बाजीराव पेशव्यांचे फॅब्रिक पेंटिग खूपच बोलके आहे. जीवनात अनेक प्रसंगात साथ देणारा माजघरातील मजबूत झोपाळा खूप काही सांगून जातो! इतिहासकार कै. सेतुमाधव पगडी, म.श्री दिक्षीत, ना स. इनामदार, रणजीत देसाई आदी मान्यवरांनी वाड्यास भेट दिली आहे.

चंद्रशेखर बर्वे - 9421912214 (सरदार मल्‍हार दादोजी बर्वे यांचे वंशज)

- चंद्रशेखर बुरांडे

डुबेरे गावची प्राक्तनरेषा – सटवाई!

See author's posts

डुबेरे हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरापासून दक्षिणेकडे सात किलोमीटरवर आहे. गाव छोटे पण टुमदार आहे. एका बाजूला औंढपट्टा डोंगराची रांग आहे व दुसऱ्या बाजूला एकच डोंगर ध्यानस्थ ऋषीसारखा बसलेला आहे. त्यावर गावकर्यां नी देवीचे छोटेसे मंदिर बांधलेले आहे. डुबेरे गावाला निसर्गाने सौंदर्य मुक्त हस्ताने दिले आहे. गाव दाट झाडीत वसलेले आहे; आंबराया, चिंचेची बने, बोरी-बाभळी यांनी गाव व्यापून टाकलेले आहे. गावाला काटेरी झाडांचे भक्कम कुंपण आहे. डुबेरे गावाची ओळख थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मगाव म्हणून आहे.

गावाचे नाव डुबेरे का पडले? लोक मजेदार आख्यायिका सांगतात. गाव गर्द झाडीत डुबलेले असल्यामुळेच डुबेलऽ ऽ  डुबेलचे ‘डुबेर’ झाले. गावाला पूर्वी भक्कम तटबंदी होती. गावाला दोन वेशी आहेत. गावातील घरांची रचना सुडौल आहे. रस्ते व गल्ल्या एकमेकांना काटकोनात छेदतात. ते गाव अंताजी बर्वे यांनी तीनशे वर्षांपूर्वी वसवले असे मानले जाते. गाव डोंगरात असल्याने गवताची राने आहेत.

गावात वाजे, ढोली, वारुंगसे, माळी हे आडनाव धारण करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोण कोठून येऊन कधी स्थायिक झाले त्याचा पुरावा उपलब्ध नाही. वाजे हे कुटुंब बर्वे यांच्याबरोबरच डुबेरे येथे आल्याचे समजले जाते. वाजे हे पूर्वीचे शिर्के होते. संभाजी महाराजांनी शिर्के यांचे शिरकाण केले. त्या भयापोटी पुण्यातील शिर्के मंडळी डोंगराचा आश्रय घेत सिन्नर तालुक्यातील डुबेरे, पांढुर्ली येथे स्थायिक झाल्याचे दिसून येते.

गावात ऐतिहासिक सप्तश्रृंगीगड, भैरवनाथ मंदिर, सटवाई (सटुआई) माता यांची मंदिरे आहेत. गावाची लोकसंख्या जेमतेम सात हजार इतकी आहे. गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती व्यवसायाशी निगडित राहून गुण्यागोविंदाने नांदणारी कुळवाडी, बारा बलुतेदार समाज तेथे स्थिरावला आहे. विडी व्यवसाय हा शेतीपूरक व जगण्याचा एकमेव आधार म्हणून ओळखला जाऊ लागला. डुबेरे गावात धनगर समाजाचे लोक घोंगड्या विणण्याचा व्यवसाय करत असत. गावाची लोकसंख्या वाढत गेली. शिवार मात्र तेवढाच राहिला. शेतीचा हिशोब एकरावरून बिघा व आता पांड (गुंठा) या भाषेत होऊ लागला. गावाला बगल देऊन खळखळ वाहणारी ढोकी नदी आहे. गावची रचना नगररचना केल्यासारखी आहे. इतिहासकालीन पेशवेवाडा, दक्षिणोत्तर राजेशाही, प्रवेशद्वार टेहळणीसाठी बुरुज, बसण्यासाठी चौकांची रचना आहे. भाजी मंडई व जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ आरोग्य सुविधांनी युक्त आहे. गावकुसावर दलित समाजाची वस्ती आहे.

महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी सटवाईची मंदिरे दिसून येतात. डुबेरे हे त्यांपैकी एक. सटवाई ही मूल जन्माला आल्यानंतर त्याचे भविष्य लिहिते असा (अंध) समज आहे. सटवाई ही ब्रह्मदेवाची मुलगी मानली जाते. तिच्या मांडीवर बाळ आहे. बर्वे यांनी सटवाई मंदिर बांधले व ताम्रपट करून भट यांना मंदिराचे पुजारी म्हणून परंपरेने नेमले आहे. देवीच्या मंदिरात शेंदूर लावलेल्या दोन पाषाणमूर्ती आहेत. बाळाचे नशीब त्याचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी लिहिणारी देवता म्हणजे सटवाई व बाळाच्या आरोग्याची काळजी घेणारी देवता म्हणजे जीवती. मात्र सटवाई व जीवती या दोन बहिणींचे आपापसात कधीच पटत नसल्यामुळे त्यांचे भाविकसुद्धा परस्परविरोधी देवतांना जात नाहीत.

सटवाई मंदिराची यात्रा भरवली जात नाही. कारण गावाला दोन रस्ते असतील तरच म्हणे यात्रा भरवली जाते! जहागीरदार बर्वे विश्वस्त म्हणून मंदिराचे काम बघत असत. परंतु ‘सटवाई मंदिर ट्रस्ट’ची स्थापना१९८७ साली झाली. पूर्वीचे जुनाट मंदिर पाडून नवे बांधले गेले. त्यात अद्ययावत मंदिर, गर्भगृह, सभामंडप, पाणपोई इत्यादी सुविधा आहेत. भक्तनिवासाची सोय आहे. हरीभक्त परायण त्र्यंबकबाबा भगत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. देवी मंदिराच्या सभागृहात पंचधातूच्या काल्पनिक श्री सटवाई देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एप्रिल २००१ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी झाली. महामंडलेश्वर आचार्य महंत रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे मार्गदर्शन त्याकरता लाभले.

मानववंश शास्त्रात संशोधन करणारी फ्रान्सची जेसिका हेकीट ही अभ्यासक सटवाईची परंपरा जाणून घेण्यासाठी डुबेरे येथे येऊन गेली. तिने गावात तीन आठवडे राहून सटवाईचा अभ्यास केला.

डुबेरे गावातील भोपळा वृक्ष हे झाड प्रसिद्ध आहे. ते झाड सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर डुबेरे येथील बुद्धमंदिराजवळ ढोकी नदीच्या काठी आहे. ते हरी काळू रुपवते यांच्या मालकीच्या जागेत आहे. वृक्षाला जुलै-ऑगस्ट महिन्यांत बुंधा, खोड, फांद्या व सर्वत्र फुले येतात आणि  सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गोल भोपळे लागतात. झाड कसे आले? कोणी लावले? त्यांचे वय किती? यांविषयी माहिती उपलब्ध नाही. गोपाळा कबीर नावाच्या साधूने ते झाड लावले असे मानले जाते. ग्रामपंचायतीने झाडाच्या रक्षणासाठी बुंध्याजवळ संरक्षक ओटा बांधला आहे. झाडाची फळे खाण्यासाठी वापरत नाहीत. त्यापासून विणा, एकतारी बनवतात. वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक प्र.के. घाणेकर यांनी डुबेरे येथे भेट दिली. त्यांनी सांगितले, की त्या झाडाचे शास्त्रीय नाव ‘क्रिसेन्शीया कुजेटा’ असे आहे. त्याला इंग्रजीत ‘बेगर्स बाऊल’ किंवा ‘कॅलॅबश ट्री’ व हिंदीमध्ये विलायती बेल असे म्हणतात. तो छोटा वृक्ष मूळचा विषुववृत्तीय दक्षिण अमेरिकेमधील आहे. त्याच्या बियांपासून तेल काढतात. ते झाड ब्रिगेनिएसी या कुळातील आहे. ती झाडे मुंबईतील राणीचा बाग; तसेच, पुण्यातील बी.एम.सी.सी. कॉलेज, गोखले अर्कशाळा परिसर या ठिकाणी आहेत. भोपळ्याचे वेल असतात. तसेच त्याचे फूल एकलिंगी असते. त्यामुळे भोपळीवेल व भोपळीसदृश्य असलेल्या डुबेरे येथील या झाडाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. एक वेगळे, दुर्मीळ झाड बघण्यासाठी पर्यटक मात्र तेथे येत असतात.

भैरवनाथ मंदिर हे डुबेरे येथील ग्रामदैवत आहे. ते गावाच्या पश्चिम दिशेला आहे. भैरवनाथ मंदिराची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरवली जाते. भैरवनाथाची काठी माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी दांडी पौर्णिमेला गावभर मिरवली जाते. त्या काठीची पूजा चैत्र पौर्णिमेपर्यंत करतात. भैरवनाथ यात्रेच्या दिवशी रात्रभर जागरण-गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. एखाद्या मनुष्यास, प्राण्यास सर्पदंश झाला तर त्याला त्या मंदिरात तीन-चार दिवस ठेवतात व त्यानंतर सत्यनारायणाची पूजा करून किंवा साधा गुळ-खोबऱ्याचा प्रसाद तेथे तयार करून तो देतात. त्या मनुष्याला नवे कपडे परिधान करून त्यानंतर वाजत-गाजत गावातील सर्व देवतांचे दर्शन करतात. मंदिर पूर्वी छोट्या स्वरूपाचे होते. गावातील सर्व लोकांनी मिळून त्याचे भक्कम स्वरूपाचे मंदिर बांधले आहे. मंदिरात भैरवनाथ मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते डुबेरेगड म्हणून ओळखले जाते. डुबेरेगडावर सप्तश्रृंगी देवीचे मंदिर बांधले आहे. त्या ठिकाणी नवरात्र उत्सवात यात्रा भरवली जाते. गडाच्या पायथ्याशी अमरगिरी महाराजांचा शांतिगिरी आश्रम आहे व नागेश्वराचे मंदिर आहे. नागेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरवली जाते.

कोळी गुरुजींनी प्रेरणा दिल्याने गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. गावात राममंदिर, विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर असून तेथे हरिनाम सप्ताह चालतो. वारकरी संप्रदायातून दिंडीचाही कार्यक्रम केला जातो. गावात स्वाध्याय केंद्रही आहे. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने चालणारे स्वामी समर्थ केंद्रही गावात आहे.

–  मोहिनी माळी

https://www.thinkmaharashtra.com/%e0%a4%a1%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b7/

पहाटे चारच्या सुमारास डुबेरवाडीतील महादेवाच्या मंदिरा पाशी पोहचली. मावळतीकडे झुकलेल्या अश्विनी पौर्णिमेच्या चंद्राला निरोप देऊन आम्ही डुबेरच्या किल्ल्याकडे कूच केली.

प्रचि १

चराचरात चैतन्य जागवणार्‍या दिनकराला अभिवादन करण्यासाठी पशुपक्षी आपली फौज घेऊन सज्ज झाली होती. पर्वतीही मोठी भासावी इतका पिटुकला चढ चढुन डुबेरवर पोहचलो तेव्हा आकाशवाणीवर सुर्व्यांचं मंगल प्रभात सुरु झालं होतं.

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

पुर्वेच्या रंगात उजळुन निघालेली सप्तशृंगी देवीची प्रसन्न मुर्ती.

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

चारही बाजुच्या पठारी प्रदेशावर लक्ष ठेवणारा डुबेरचा किल्ला अगदीच आटोपशीर आहे. वर जाण्यासाठी महादेव मंदिराच्या उजवीकडुन पायर्‍यांची वाट आहे. किल्ल्यावर पाण्याच तळं आहे.

प्रचि ८

तासाभरात गडफेरी उरकुन खाली आलो. डुबेर गावात थोरल्या बाजीराव पेशव्यांचा वाडा आहे. त्याला नक्की भेट द्या असे ओंकारने आवर्जुन सांगितले होते.

प्रचि ९

डुबेर फाट्यावर सकाळचा नाष्टा करुन आम्ही ठाणगावच्या दिशेने निघालो. डुबेर ते ठाणगांव या १६ कि.मी. च्या रस्त्यावर महामंडळ्याच्या बर्‍याच फेर्‍या आहेत. आड किल्ल्यावर जाण्यासाठी आधी ठाणगावात पोहचावे लागते. तेथुन डावीकडचा रस्ता पट्टावाडीकडे तर उजवीकडचा सरळ रस्ता आड किल्ल्याकडे घेऊन जातो. 

डूबेरगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : २८५५ फुट

श्रेणी : सोपी

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात ठाणगाव- सिन्नर रस्त्यावर सिन्नरच्या अलीकडे ४ कि.मी.वर डूबेरा नावाचं गाव आहे. डुबेरे गावात जाण्यासाठी मुंबईहून घोटीमार्गे सिन्नरकडे जायचे. सिन्नरच्या थोडं अलीकडे उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावरून १३ कि.मी. आत डुबेरे गाव आहे. गावाला दोन प्रवेशद्वार असुन थोडीफार तटबंदी आहे. डुबेरगावात बर्वेंवाडा असून या वाड्यात थोरल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. गावाच्या मागेच माथ्यावर देवीचे देऊळ असणारा छोटा डुबेरगड दिसतो. डूबेरा गावात डुबेरगड देवीगड म्हणुन ओळखला जातो. डुबेरगडाच्या पायथ्याशी शंकराचे मंदिर असून जवळच पाण्याची विहीर असल्याने या मंदिरात निवासाची सोय होऊ शकते. गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर असून वर जाण्यास सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. या पायऱ्याच्या सुरवातीस एक छोटी घुमटी असुन त्यात सप्तशृंगी देवीची मुर्ती व तांदळा आहे. जवळपास पाचशे पायऱ्या चढून अर्ध्या तासात आपण डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो. किल्ल्यावर एक मोठा तलाव, सप्तशृंगी देवीचं मंदिर, एक पडझड झालेली सिमेंटची इमारत आणि त्याच्यासमोर खालील बाजुस दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गडावर पिण्यास पाणी नसल्याने ते सोबत ठेवावे लागते. याशिवाय गडावर एक दर्गा असुन दोन ठिकाणी पादुकाशिल्प आहे. यातील एक शिल्प पावसाळी साचपाण्याच्या तलावात औदुंबराच्या झाडाखाली आहे. गडाच्या माथ्यावरून वायव्य दिशेला सप्तश्रुंगगड , मार्कंडेय, रावळ्या– जावळ्या हे जोड किल्ले दिसतात. गडफेरी करायला अर्धा तास पुरेसा होतो. डूबेरगडाचा वापर केवळ टेहळणी करीता होत असावा. कोणत्याही ऋतूत डूबेरगडाला सहज भेट देता येते. डूबेरा गाव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे आजोळ. या गावात बर्वेवाडा नावाचा सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा वाडा आहे. अजूनही सुस्थितीत असलेला १ बुरुज अन जाड तटभिंती असणारा हा वाडा म्हणजे मल्हार अंताजी बर्वे यांचा वाडा. हे मल्हार म्हणजे राधाबाईंचे सख्खे बंधू. ताराराणींच्या कारकिर्दीत मल्हार अंताजी बर्वे यांना हे गाव इनाम सोपवले गेले व हे घराणे इथेच स्थायिक झाले. या भागात मोठ्या प्रमाणावर गवत वाढत असल्याने कुरणासाठी हि जागा योग्य होती. बर्वे घराण्यावर गाई बैलांची मोठ्या प्रमाणावर पैदास करून चांगल्या प्रतीचे बैल तोफांचे गाडे हाकण्याच्या कामी पाठवण्याची जबाबदारी होती. राधाबाईंचे माहेर कोकणात परंतु त्या गरोदर असताना पावसाळ्याचे दिवस होते. अशा वेळेस त्यांना माहेरी कोकणात पाठवण्याऐवजी घाटावर त्यांचे बंधू मल्हार यांच्या घरी प्रसूतीसाठी पाठवण्यात आले. याच वाड्यात राधाबाईंच्या पोटी पहिले पेशवे बाजीराव यांचा भाद्रपद महिन्यात सन १७०० मध्ये जन्म झाला. वाड्यातील ती खोली अन पलंग अजूनही सुस्थितीत आहेत. सध्या वाड्यात बर्वे घराण्याची अकरावी पिढी रहात आहे. पूर्वभिमुख असलेल्या बर्वेंवाड्याला दोन भव्य प्रवेशद्वारे होती पण यातील रस्त्याच्या बाजुला असणारे प्रवेशद्वार आता बुजविण्यात आले आहे. गावाला दोन भव्य वेशी असुन पश्चिमेकडील वेशीजवळ पेशवेकालीन गणपतीची मुर्ती असलेले मंदीर आहे. वाड्यातील बहुतेक गोष्टी आजही सुस्थितीत असुन ४०० वर्षानंतर आजही वापरात आहेत. लाकडी खांबांवरचे नक्षीकाम फार सुंदर आहे. भिंतींमध्ये धान्य साठवण्याचे कोठार तसेच जमीनीत तळघरे आहेत. वाड्यात एक विहीर असून त्या शेजारीच घोड्यांची पागा असायची. वाड्यात काही वर्षांपूर्वी गावातील शाळा भरत असे पण जागा अपुरी पडल्याने ती दुसरीकडे स्थलांतरित झाली. वाड्याशेजारी सटवाई देवीचे मोठे मंदिर आहे. डूबेरगड पहायला आले असता या वाड्याला जरूर भेट द्यावी. १६७९ साली जालन्याची लूट करून मराठी सैन्य परतत असताना मोगल सरदार रणमस्तखानाने त्यांची वाट अडवली. त्याच्या मागून सरदार केसरीसिंह यांची ज्यादा फौज चालून आल्याने खजिन्याची मोंगलांच्या तावडीतुन सुटका कशी करावी हा पेच पडला. त्यावेळी बहिर्जी नाईक याने अत्यंत शिताफीने ही सगळी फौज खजिन्यासकट डूबेरमार्गे पट्टा किल्ल्यावर नेली आणि मोगलांच्या हल्ल्यापासून मराठ्यांची आणि महाराजांची सुटका केली. पट्टा किल्ल्यावर जाताना महाराजांनी एक दिवस येथे मुक्काम केलं व राजे २२ नोव्हेंबर १६७९ रोजी पट्टागडावर गेले अशी माहिती स्थानिकाकडून सांगण्यात येते.
© Suresh Nimbalkar

मग आम्ही निघालो बर्व्यांचा वाडा पाहण्यासाठी डुबेरा गावाकडे .

साधारण दुपारच्या २ च्या सुमारास आम्ही बर्व्यांच्या वाड्यात प्रवेश केला.राधाबाई म्हणजेच थोरले बाजीराव पेशव्यांच्या आई ह्या माहेरपणाला येथे आल्या होता असे म्हंटले जाते (राधाबाईंचे माहेरचे आडनाव बर्वे असे होते).
वाड्याला तटबंदी आहे आणि बांधकाम बघताच कळून येते कि हे पेशवेकालीन असावे .वाड्याच्या लाकडी कमानी,दरवाजे पाहण्यासारखे आहे , लाकडी खांबांवरील नक्षीकाम सुंदर केले आहे .सध्या वाडा  ज्यांच्या ताब्यात आहे ते लोक तेथे नसल्याने आम्हाला खोल्या मात्र बघता  आल्या नाहीत . पण बाजीरावांचे जन्म स्थान असलेला हा वाडा बाहेरून का असेना बघितल्याचा आनंद झाला .

वाडा बघून आल्यावर मला बाहेर वाड्याच्या वरच्या मजल्यावरील कमानी आणि छोटे खांब दिसले ते पाहिल्यावर पूर्वीच्या काळी हा वाडा  नांदता असताना त्याला पदडे असतील तेव्हा ते किती सुंदर दिसत असेल  हा विचार माझ्या मनात आला ,ते चित्र मनात रंगवत मग सर्वांसह डुबेरा किल्ल्याची वाट पकडली .

लाकडी खांबावरील नक्षीकाम 

वाडा बाहेरून 
साधारण २० मिनिटात आम्ही डुबेरा किल्ल्यावर पोहोचलो .किल्ल्याच्या पायथ्याशी महादेव मंदिर आहे,हे मंदिर प्रशस्थ आहे. बांधकाम मात्र आताचेच आहे . किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्यांची सोय  आहे . साधारण १५ मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो ,गडावर फारसे अवशेष नाहीत दोन पाण्याची टाकी आणि सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे . मंदिरातील मातेची मूर्ती वणीच्या  सप्तशृंगी मातेच्या  मूर्तीसारखीच आहे .डुबेरा किल्ल्याच्या  विस्तारावरून ह्या गडावर पण वर्दळ असेल असे जाणवते . डुबेरा वरून सुद्धा आपल्याला आड,पट्टा ,बितनगड आणि अवंधा किल्ल्यांची रांग दिसते.

                                                                 सप्तशृंगी मातेचे मंदिर 
किल्ला पाहून १० मिनटात खाली आम्ही खाली उतरलो आणि परत परतीच्या प्रवासाला लागून साधारण ८ .३०
वाजता कल्याण ला पोहोचलो .बाजीरावांचे आजोळ ,डुबेरा किल्ला  आणि आड किल्ल्यावरील रॅपलींग च्या अनुभवामुळे माझा हा ट्रेक मस्त झाला. 
किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल – ह्या दोन्ही किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही , परंतु सिन्नर ह्या बाजारपेठेवरील मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्यांचा वापर होत असावा असा अंदाज आहे. 
किल्ल्यांची आणि  किल्ल्यांवर पोहोचण्याच्या वाटांच्या   माहितीसाठी www .trekshitiz.com ह्या वेबसाईट वर जावा,ह्याच आणि अजून बऱ्याच किल्ल्यांची माहिती साईट वर उपलब्ध आहे. 

डुबेरे गावचा बर्वे वाडा – बाजीरावाचे जन्‍मस्‍थान

See author's posts

Carasole

थोरल्या बाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे येथील बर्वे वाड्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. थोरले बाजीराव हे राधाबाई व बाळाजी विश्वनाथ यांचे प्रथम संतान. बाळाजी विश्वनाथ भट हे स्वकर्तृत्वाने अनेक वर्षांच्या सेवेनंतर पेशवे पदावर पोचले.

मल्हार बर्वे यांना छत्रपती राजारामांकडून, गंगथडी प्रांतात चौदा महालांची चौथाई व जहागिरी मिळाली होती. पेशव्यांच्या पागेला चारा व खिल्लारे पुरवण्याचे काम बर्वे करत असत. पुढील काळात, त्यांनी निफाडजवळ कोहुरे व डुबेरे ही गावे वसवली. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदी नियुक्त केले. थोरले बाजीराव मराठा साम्राज्य वाढवण्यासाठी आयुष्यभर यशस्वीपणे लढत राहिले. अवघे चाळीस वर्ष जीवन लाभलेल्या व उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या त्या धूर्त, पराक्रमी व मुत्सद्दी पेशव्याचा अंत, २८ एप्रील १७४० रोजी, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील, रावेरखेडी येथे उष्माघाताने झाला. त्यांचा अंत्यसंस्कार रावेरखेडी येथे करून त्यांची समाधी नर्मदेच्या काठावर बांधण्यात आली.

डुबेरे हे गाव सिन्नरच्या दक्षिणेला सात किलोमीटर अंतरावर आहे. एका बाजूला औंढा पट्टयांची रांग व दुस-या बाजूला सप्तशृंगी देवीचे मंदिर असलेला डुबेर डोंगर. त्‍या डोंगर पायथ्याशी दाट झाडीत डुबलेले म्हणून गावाचे ‘डुबेरे हे नाव. त्या परिसरात अजूनही पेशवेकालीन बैठी व दुमजली घरे आहेत. डुबेरे गावातील मुख्य गल्ल्या व बोळ; अरुंद रस्ते एकमेकांना समांतर व काटकोनात छेदणारे आहेत, हे विशेष. बर्वेवाडा गावाच्या मध्यभागी आहे. तो १६९५ च्या आसपास बांधला गेला असावा. वाड्याचे बांधकाम भक्कम आहे. ते  चपट्या विटा व चिरेबंद घडीव दगड यांनी केलेले आहे. चहुबाजूनी तटबंदी आहे. वाड्यास एक टेहळणी बुरुज आहे. त्या बुरुजावरुन गावाचा पूर्ण परिसर नजरेत भरतो. वाड्याच्या संरक्षणार्थ, गच्चीवरील अर्धगोलाकार मुंढा-यांच्या तळ भागातील जंग्याचा उपयोग शत्रूवर गोळ्या झाडण्यासाठी असे. मध्यंतरीच्या काळात पडझड झालेल्या भागाची डागडुजी चुकीच्या कार्यपद्धतीने झाल्याचे दाखले इमारतीवर ठिकठिकाणी दिसून येतात. त्यामुळे वाड्याच्या सौंदर्यास बाधा पोचली आहे. अशी दृष्ये संवेदनशील मनाला पटत नाहीत.

मुख्य रस्त्यावरुन पश्चिम दरवाज्याकडे जाताना सर्वप्रथम नजरेत भरतात त्या उत्तराभिमुख चिरेबंद भिंतीच्या खोबणीत चफकलतेने बसवलेल्या सलग रेषेतील सात खिडक्या. त्या विशिष्ट आकृतिबंधातील लाकडी खिडक्या ही बर्वे वाड्याची शान आहे! त्या जागेतून, युद्धावर निघालेल्या किंवा पराक्रम गाजवून परतणा-या स्वकुळातील पुरुषांवर किंवा अती महत्‍त्‍वाच्या पाहुण्यावर स्वागतपर पुष्पवृष्टी करण्याचा रिवाज असे. तसेच, पश्चिम दरवाज्यावरील नगारखान्यात वाद्यघोष वाजवून, लढाई जिंकून परतलेल्या शूर वीरांचे व पाहुण्याचे स्वागत करत असत.

वाड्याच्या आतील रचना भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित आहे. भारतीय वास्तुशास्त्रात खुल्या चौक रचनेला महत्त्व आहे. भौगोलिक दिशेचा उपयोग व तिन्ही ॠतूंत फायदेशीर ठरणा-या आणि निसर्गनियमांशी मिळत्याजुळत्या सुरक्षित जीवनशैलीला ‘भारतीय वास्तुशास्त्र’ म्हणतात. महिला व मुले यांच्या स्वास्थ्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांची गरज असते हे ओळखून चौकांची मांडणी व आकार ठरवत असत. त्या रचनेमुळे सूर्यास्तापर्यंत घरात परिवर्तित मंद प्रकाश पडे व हवा खेळती राही. पूर्वेकडील प्रवेशद्वारातील आयताकृती चौकाला लागून तीन फूट उंच चिरेबंदी जोत्यावर, कर्मचा-यांसाठी कचेरी व बैठकीची व्यवस्था आहे. त्या जोत्यावर सम अंतरातील लाकडी खांबांचा सांगाडा व चौफुली आकाराच्या लाकडी तुळयांवर आधारित कौलारू छताची रचना साधली आहे. रखरखीत सूर्यप्रकाशाची प्रखरता कमी करण्यासाठी लाकडी जाळ्यांचा उपयोग केला आहे. मोठ्या चौकानंतर दोन लहान सम आकारातील चौकांपैकी एका चौकात तुळशी वृंदावन व दुस-यात पिण्याच्या पाण्याचे आड (छोट्या गोल आकाराची घडीव दगडात बांधलेली विहीर) आहे. चौकांवर माजघर, देवघर, स्वयंपाकघर व स्वच्छतागृहांचा प्रकाश निर्भरित आहे. वाड्याचा आराखडा फक्त सुरक्षिततेला महत्त्व देऊन बनवला आहे. देवघराचा दरवाजा, लाकडी तुळयांचे टोक व खांबावरील जुजबी नक्षीकाम सोडले तर कलासौंदर्याला फारसा वाव दिलेला दिसत नाही. तसेच, खोल्यांची उंची कमी का ठेवत याचाही खुलासा होत नाही.

युद्धकाळ किंवा अडीअडचणीच्या वेळी, धान्यसाठा मुबलक असावा यासाठी वाड्यात बळंद (दोन भिंतीतील पोकळी) व इतर खोल्यांची रचना केली आहे. बळंदात उतरण्यासाठी लाकडी ओंडक्यांची व्यवस्था आहे. तेथे परिवर्तित सूर्यप्रकाश व शुद्ध खेळती हवा राहील असे नियोजन आहे. तळमजल्यावरील भिंतीत केलेल्या पोकळीची लाकडी झडप वर ओढून हवे तेवढेच धान्य काढता येई. पडवी ते माजघर मार्गावरील भिंतीच्या रुंद गाभ्यातील अरुंद जिन्याची रचना अपरिचित माणसास चटकन दिसू नये अशी आहे. चार ते पाच फूट रुंद भिंतीच्या गाभ्यात सामानासाठी फडताळे व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी गुप्त कोनाडे आहेत. रात्रप्रकाशदिव्यांसाठी ठिकठिकाणी छोटे कोनाडे व वस्तू अडकवण्यासाठी लाकडी खुट्यांचा वापर आढळतो.

बाळंत स्त्रीस आवश्यक असणा-या, थंड व उबदार खोलीची रचना वास्तुशास्त्रास धरुन आहे. त्या खोलीतील खिडक्यांची रचना जरुरीपुरता सूर्यप्रकाश, शुद्ध हवा व गरम हवेचे संतुलन राहील अशी आहे. अवघडलेल्या बाळांत स्त्रीस, अंघोळ घालण्यासाठी केलेल्या रचनेतील वेगळेपण समजावल्याशिवाय कळत नाही! परस्थ स्त्रियांना, बाह्य दरवाजातून आत घेण्यासाठीची सूचकता व वरील रचनेतील सर्व खुबी पाहून नवल वाटते! त्यावरुन, वर्तमान आधुनिक जीवनपद्धतीतील कृत्रिमपणा भारतीय जीवनशैलीशी किती फारकत घेणारा आहे हे दिसून येते! त्यामुळेच, शहरात तोकड्या सदनिकेत ‘न मिळणारे वास्तुसुख शोधणा-यांची संख्याच अधिक आहे;

साधारण दोन एकर जमिनीवरील तटबंदीचा जोत्यापर्यंतच्या भाग दगडात व त्यावरचा भाग मातीचा आहे. विशिष्ट पद्धतीने कमावलेल्या त्या मातीचे कुतूहल सर्वांनाच असते. मातीची संलग्नता व क्षमता वाढवण्यासाठी खापरी तुकडे, घोड्याची लीद, शंख-शिंपल्याचा चुरा, छोटे गोटे व विशिष्ट वनस्पतींच्या रसाचे म़िश्रण एकजीव होईपर्यंत बैलांकडून तुडवून, अनेक दिवस थंड वातावरणात भिजत ठेवत. ओल्या मातीचे घट्ट ढेकळ एकमेकांवर रचून भिंत बांधली जात असे. वाड्याच्या दक्षिण भागात घोड्यांच्या पागा व जनावरांचे गोठे आहेत.

पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून जपलेल्या मोजक्या शस्त्रसंग्रहात ढाल, तलवार, भाला, चिलखत इत्यादी वस्तू आहेत. त्या संग्रहातील घोड्यावर बसून भालाफेक करणारे बाजीराव पेशव्यांचे फॅब्रिक पेंटिग खूपच बोलके आहे. जीवनात अनेक प्रसंगात साथ देणारा माजघरातील मजबूत झोपाळा खूप काही सांगून जातो! इतिहासकार कै. सेतुमाधव पगडी, म.श्री दिक्षीत, ना स. इनामदार, रणजीत देसाई आदी मान्यवरांनी वाड्यास भेट दिली आहे.

चंद्रशेखर बर्वे – 9421912214 (सरदार मल्‍हार दादोजी बर्वे यांचे वंशज)

– चंद्रशेखर बुरांडे

Last Updated On – 19th May 2016

About Post Author

चंद्रशेखर बुरांडे

चंद्रशेखर बुरांडे हे आर्किटेक्ट आहेत. ते स्वतंत्र प्रक्टिस करतात. ते कन्सल्टंटही आहेत. ते मुंबईतील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. तसेच, विविध माध्यमांतून लोकांशी संवाद साधतात. ते लोकांना वास्तुशास्त्रातील सौंदर्य समजावे यासाठी प्रयत्नशील असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9819225101

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...