Wednesday, July 12, 2023

आड

 अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगररांगेच्या पुर्व बाजुस औंढा, पट्टा, आड,बितंगगड यासारखे किल्ले वसले आहेत. आड हा या रांगेतील शेवटचा किल्ला.खरतर आड म्हणजे पाण्याची विहीर.इथे मात्र या नावाचा आणि गडाचा काय संबंध आहे समजत नाही. खरतर जगातॉल एकमेव गिरीदुर्ग आणि किल्ल्यांनी भरलेला प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. उभ्याआडव्या पसरलेल्या महाराष्ट्रात जवळपास साडे तीनशे दुर्ग आहेत. आजअखेर कित्येक दुर्ग उपेक्षेच्या गर्तेत होते.आता मात्र या देशीचे दुर्गप्रेमींची पावले या गिरीदुर्गावर उमटू लागली आहेत. बर्याच दुर्गांकडे स्थानिक व्यक्तींकडून दुर्लझ केले जाते. मात्र आड किल्ल्याच्या सुदैवाने स्थानिक लोकांची या गडावर वर्दळ तर आहेच शिवाय त्यांची इथे दैवते असल्यामुळे तुलनेने गडाबद्दल आदर जाणवतो. 
   मात्र बहुतेक किल्ले भटकणार्यंनी लोकांनीही या आड किल्ल्याचे नाव एकले नसते किंवा अगदी आवर्जून इथे कोणी जात नाही.मात्र या परिसरातील गड पहाण्यास आल्यावर या आड किल्ल्याला जरुर भेट द्यावी.
 
 
   या गडाकड जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. यापैकी दोन मार्ग सिन्नरकडून तर एक मार्ग घोटी-टाकेद कडून आहे. 
१ ) नाशिकपासून सिन्नर सुमारे २३ कि.मी. आहे. सिन्नरवरुन कोनांवे हे गाव गाठायचे. कोनांबेवरुन डोंगरवाटेने गडाच्या पायथ्याची आडवाडी गाठता येते.कसारा-घोटी-टाकेद-ठाणगाव-सिन्नर अशी एस.टी. देखील आहे.
२) या किल्ल्यावर जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे सिन्नरवरुन एस.टी.ने  ठाणगाव गाठावे लागते. सिन्नर -ठाणगाव १७ कि.मी आहे. इथून आडवाडी ९ कि.मी. आहे. आडवाडी वसलेल्या पठारावर मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या उभारल्यामुळे इथे रस्त्याचे जाळे झाले आहे. अर्थात एस.टी. उपलब्ध नसल्यास पायीच ठाणगाव ते आडवाडी अंतर कापावे लागते. किंवा स्वतःचे वाहन असेल तर जास्ती सोयीचे. सिन्नरवरुन आडवाडीसाठी सकाळी पावणे दहाला एक.टी.वस आहे. ती आडवाडीला साडे दहापर्यंत येते. तसेच आडवाडीसाठीची मुक्कामी बस संध्याकाळी साडेसहा वाजता आहे. 
 ३)  घोटी- भंडारदरा रस्त्यावरील टाकेद गावातून म्हैसवळण घाटमार्गे घोटी-ठाणगाव हे अंतर ५२ किमी तर सिन्नरमार्गे ७५ कि.मी आहे. हा तिसरा मार्ग घोटी-टाकेद-कोकणवाडी-पट्टावाडी- तिरडे-आडवाडी असा आहे.
   आडवाडी गावाच्या तीन वाड्या आहेत.खालची वाडी, मधली वाडी आणि वरची आडवाडी. यापैकी वरची आडवाडी गडाच्या पायथ्याला वसलेली असल्यामुळे आपल्याला तिथेपर्यंत जाणे भाग आहे.  
 
  आड गडाचा नकाशा
 
    वरच्या आडवाडीतून रस्त्याने थोडे पुढे आल्यावर एखाद्या घराप्रमाणेच दिसणारा महानुभव पंथाचा आश्रम आहे. गावातली ३०० घर महानुभाव पंथाची आहेत . त्यांनीच गावात श्रीकृष्णाचे मंदिर बांधले आहे .गावात दुधदुभत भरपूर आहे. एकेकाळी गावातून मोठ्या प्रमाणावर खवा सिन्नरच्या बाजारात जायचा. या भागतले उघडे बोडके डोंगर दिसतात त्याच कारण हा खवा आहे. खवा बनवण्यासाठी भरपूर सरपण लागायच त्यामुळे जंगलतोड झाली. गावातील  सर्व लोक आता दिवसातून दोनदा दुध सिन्नरच्या बाजारात घेउन जातात. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन जीप सिन्नरला जातात.

या महानुभाव पंथीयांच्या आश्रमाजवळून एक रूळलेली पायवाट अर्ध्या तासात आपल्याला गडावर घेऊन जाते व तुटलेल्या तटबंदीतुन आपण गडावर प्रवेश करतो. गडावर जाण्याचा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. या शिवाय गावातून किल्ल्याकडे जाणारी अजुन एक पण थोडी दुरची वाट आहे. आडवाडीच्या बाजुने आड किल्ल्याची एक सोंड खाली गावाकडे उतरते. वाटेत आपल्याला एक प्रशस्त जलाशय लागतो. हा धरण बांधल्यामुळे निर्माण झालेला आहे. या पाण्यावर द्राक्षे ,टोमॅटोसारखी पिके घेतली जातात. तसेच मासेमारी केली जाते. गावातुन आल्यास वाटेतील धरण पार केल्यावर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात येतो. कौलारू मंदिरात हनुमानची मुर्ती आणि काही वीरगळी ठेवलेल्या आहेत .याशिवाय या मंदीरात भैरव्,नागशिळा, उध्वस्त पिंड दिसते. जवळचा पाण्याची मोठी विहीर दिसते. अशी पश्चिमाभिमुख हनुमान मुर्ती सहसा बघायला मिळत नाही. या मंदिरापासून किल्ल्याच्या मध्यावर असलेल्या गुहेपर्यंत जाण्यासाठी पाउलवाट आहे  


 
 
                                          मारुती मंदिराच्या मागून दिसणारा डुबेरा  किल्ला
 
पाउलवाटेला लागल्यावर १० मिनिटे चढ चढल्यावर  एका आंब्याच्या झाडाखाली आलो. येथुन सोंडेवरून थोडा चढ चढल्यावर वाट उजवीकडे वळते  इथे एक वाटनाका आहे. डावीकडे जाणारी वाट गडाच्या कातळ कड्यावर दिसणार्या भगव्या ध्वजाकडे जाते तर उजवीकडची वाट गडमाथ्यावर जाणार्या कातळकोरीव पायर्याकडे घेउन जाते. आपण प्रथम डाव्या हाताने जाउन गडाच्या कड्यत असणार्या आडूबाईच्या गुहेकडे जाउया. आडु बाईची गुहा ही एक डोंगराच्या कातळटोपी खाली असलेली भलीमोठी नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत कातळात कोरलेला बसण्यासाठी केलेला ओटा आणि एक टाक या मानवनिर्मित गोष्टी दिसतात.साधारण दोन-अडीचशे माणसे बसु शकतील असा या गुहेचा प्रशस्त आकार आहे. जवळपास पुरुषभर उंचीच्या या गुहेत कोण्या साधुने एका कोपर्यात भिंत उभारुन खोली केली आहे. ट्रेकर्सच्य्ता मुक्कामाला हि पुर्वाभिमुख गुहा फार छान आहे. आत खोलवर कपारीत देवीचा तांदळा आहे तर गावकर्यांनी नव्याने बसवलेली आडूबाईची मुर्ती हि आहे. मुर्तीचे मागे वाहन सिंह दिसतो. स्थानिक लोक या मुर्तीला आडुबाई किंवा मुक्ताबाई म्हणतात. नवरात्र बसते तेव्हा आणि दसर्याच्या सुमाराला इथे आसपासच्या भाविकांची गर्दी असते. स्थानिक लोकांच्या सांगण्याप्रमाणे पुर्वी या गुहेत चांदीचा कमरपट्टा , नाणी, मुर्ती अशा वस्तु सापडल्या आहेत. 
 
यानंतर आपल्याला आडच्या माथ्यावर जायचे असल्यामुळे पुन्हा वाटनाक्यापाशी यावे व उजवी वाट पकडावी. इथून पुढे १० कातीव पायऱ्या चढून आपल्याला गडमाथा गाठायचा आहे पण पायऱ्यांच्या  उजव्या बाजूला काही आधार नसल्याने सुरक्षितता म्हणून जपून चढायचे.
 
 

 किल्ला उतरताना या कातळात कोरलेल्या पायऱ्यावर थोडी काळजी घ्यावी लागते. . किल्ला चढताना दरीकडे पाठ असल्याने पायर्यांची भयानकता जाणवत नाही. पण उतरताना तिन्ही बाजूला दरी असल्याने कातळाकडे तोंड करुन उतरणे सोयीचे पडते.  पाय खालच्या पायरीवर टेकेपर्यंत हाताची पकड सोडायची नाही हा नियम पाळला कि अवघड जात नाही. थोड्या वेळात हे साहस पार पाडून आपण गडमाथ्यावर दाखल होतो.  गडाचा माथा एक विस्तीर्ण पठार असुन दक्षिणोत्तर साधारण ४० एकरवर पसरलेले आहे.गडाची उंची समुद्रसपाटीपासून ४०२८ फुट आहे. गावातुन तासाभरात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. 
 
 

आड गडावर असलेली समाधी
 

   गडाची बरीच पडझड झाली असुन काही ठिकाणी तुरळक तटबंदी दिसते. गडाच्या माथ्यावर काही उद्‌ध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसुन येतात. यातील एका अवशेषात दगडी शिल्प असुन त्याची मोठया प्रमाणात झिज झाल्याने त्यातील शिल्प ओळखु येत नाही. या मूर्तीसमोर दिपमाळेसारखा एक मोठा दगडी दिवा ठेवलेला आहे. किल्ल्याच्या मधील उंचवट्यावर दोन वाड्यांची जोती असुन यातील एका चौथऱ्यावर समाधी आहे. याशिवाय गडाच्या पश्चिमेला अजुन एका वास्तुचे भिंतीसह अवशेष दिसुन येतात. 
 


 
 
 
गडावर सहा ठिकाणी पाण्याची एकुण सोळा टाकी असुन गुहेकडील एक टाके वगळता इतर पाच ठिकाणी जोडटाकी आहेत. या सर्व टाक्यात पाणी जमा करण्यासाठी खडकावर चर खोदलेले आहेत. विशेष म्हणजे एका टाक्यावर शरभ शिल्प आहे जे बहुधा गडावरील दरवाजे अथवा तटबंदीवर दिसते .

                                                              गडावरील पाण्याची टाकी  

                                                             शरभ शिल्प  असलेले टाके
 याशिवाय गडावर एक मोठा साचपाण्याचा तलाव आहे. गडावरील पाण्याची सोय व सर्वत्र विखुरलेले अवशेष पहाता गड नांदता असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी.

 
 


१) आडवाडीतून दिसणारा  आडगाड २) किल्ल्यावरील खोदीव टाकीं ३) गडावरचा उध्वस्त दरवाजा ४)आडुबाईची गुहा आणि मंदिर 
    गडावर उत्तरेकडे असलेला दरवाजा कोकण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. आज या दरवाजाची केवळ चौकट उभी असुन कमानीचे ढासळलेळे दगड आजुबाजुला विखुरलेले आहेत. किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पुर्वेला औंढा , पट्टा, बितनगड, म्हसोबा डोंगर या कळसूबाई रांगेचे दर्शन होते तर पश्चिमेला डूबेरगड दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. इतिहासात या गडाबाबत कोणत्याही नोंदी दिसून येत नाहीत. टीप - खाजगी वहानाने डुबेरगड, आड, पट्टा, औंढा आणि बितनगड हे पाच किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहुन होतात.

संदर्भ :-

१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
३) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
४) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
५) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
६) www.durgbharai.in  हि वेबसाईट
७) https://samantfort.blogspot.com  हा ब्लॉग














हि सगळी ठिकाण एका दिवसात पाहायची होती. त्यामुळे गाडी घेऊन रात्री ११ च्या सुमारस डोंबिवलीहून निघालो. कसारा घाट पार केल्यावर हवा थंड झाली, मुंबईची उकाड्यातून आल्यामुळे एकदम फ़्रेश वाटायला लागल. पहाटे ३.३० ला आड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आडवाडीत पोहोचलो. झुंजूमुंजू झाल्यावर वर जायचे होते. पण त्यासाठी अजून दोन तास बाकी होते. त्यामुळे पाठ टेकायला जागा शोधण भाग होते. गावातील शाळा, मंदिर, घरांच्या पडव्या, अंगण ही आमची नेहमीची झोपायची ठिकाण, त्या दृष्टीने शोध चालू केला. इतक्यात येवढ्या रात्रीही एक माणूस गावात फ़िरताना दिसला. त्याला विचारल्यावर त्याने जवळाच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात जायला सांगितले. श्रीकृष्णाचे मंदिर ऐसपैस होते. इथल्या पध्दतीप्रमाणे गावातले काही लोक मंदिरात झोपायला होते. आमची चाहूल लागताच काही लोक उठले आणि चौकशी चालू केली. सकाळी किल्ल्याची वाट दाखवायच एकाने मान्य केल्यावर मी आणि कौस्तुभने स्लिपिंग बॅग अंथरल्या, वैभव आणि उमेशने स्लिपिंग बॅग आणली नसल्याने त्यांनी सॅक मधून वर्तमानपत्र काढली. तितक्यात एका माणसाने त्यांना हाक मारून  उशाशी घेतलेली गोधडी दिली. या भागात दिवसा तापमान ४० अंशाच्या पुढे असले तरी रात्री मात्र व्यवस्थित थंडी असते. १२ महिने वारे वाहात असतात. त्यामुळे या भागात पवनचक्क्यांची संख्याही जास्त आहे. आम्ही झोपलेलो त्या मंदिरातही थंडगार वारा लागत होताच. पहाटेचा गजर लावून स्लिपिंग बॅगमध्ये शिरलो. दिवसभराच्या धावपळीने कधी झोप लागली कळलच नाही. अचानक नगार्याच्या आवाजाने जाग आली. काकड आरती चालू झाली होती. मागे एकदा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरात झोपलो असताना सकाळी इलेक्ट्रीकवर चालणारा ढोल आणि झांजने झोपमोड केली होती. पण आज नगारा अतिशय तालात वाजत होता आणि आरतीच्या चाली प्रमाणे त्याचा ताल बदलत होता. कुतूहलामुळे उठून बसलो. एक आजोबा समरसून नगारा वाजवत होते. आरती म्हणणाऱ्या माणसाचा आवाजही चांगला होता. पण आरतीचे शब्द मात्र मला तरी अपरिचित होते.  आमच्यातला वैभव उठून आरतीला आधीच  उभा राहीला होता. मीही गाभाऱ्या समोर जाऊन उभा राहिलो. तेंव्हा लक्षात आले की हे देउळ महानुभाव पंथांच्या लोकांचे आहे . 

Aad  Fort

आरती संपल्यावर झोपण शक्य नव्हते. मग गाववाल्यांशी गप्पा मारायला सुरुवात केली अशा गप्पांमध्ये  दंतकथा, गावचे प्रश्न, राजकारण इत्यादी अनेक गोष्टी कळतात. फक्त आपण आपला शहरी शहाणपणा आणि आगाऊपणा सोडून नम्र श्रोत्याची भुमिका घ्यायची असते आणि संवाद यज्ञ चालू ठेवण्यासाठी प्रश्नांच्या समिधा मधून मधून टाकत राहायच्या असतात. गावातली ३०० घर महानुभाव पंथाची आहेत . त्यांनीच हे श्रीकृष्णाचे मंदिर बांधले आहे .गावात दुधदुभत भरपूर आहे. एकेकाळी गावातून मोठ्या प्रमाणावर खवा सिन्नरच्या बाजारात जायचा. या भागतले उघडे बोडके डोंगर दिसतात त्याच कारण हा खवा आहे. खवा बनवण्यासाठी भरपूर सरपण लागायच त्यामुळे जंगलतोड झाली. नंतरच्या काळात पवनचक्क्या आल्या त्याबरोबर रस्ते आले, एसटी आली. आज गावात खवा बनवणार एकच घर आहे.(त्याच नाव मी गुगल मॅपवर पाहीले होते. ते त्यांना सांगितल्यावर आश्चर्य वाटले ) गावातील बाकी सर्व लोक आता दिवसातून दोनदा दुध सिन्नरच्या बाजारात घेउन जातात. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन जीप सिन्नरला जातात. गप्पा चालू असतानाच पूर्वेकडे फटफटायला लागल . त्याबरोबर आकाशाच्या पार्श्वभूमीवर पनचक्क्या फिरताना दिसायला लागल्या. गाववाल्यांकडून आम्हाला चहाचा आग्रह होत होता पण उन्हाच्या आधी आड किल्ला पाहून पुढे जायचे होते. त्यामुळे आम्ही सामान आवरून निघालो. एक गाववाला आम्हाला थोड्या अंतरापर्यंत वाट दाखवायला आला . गावाच्या बाहेर एक मातीच धरण होते . मार्च महिन्यातच त्यातला पाणीसाठा आटला होता. धरणाच्या पुढे वाट शेतातून जात होती . समोर आड किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला होता. किल्ल्याच्या उत्तर दिशेकडील डोंगरधारेच्या खाली मारुती मंदिर आहे . गावातून मंदिरापर्यंत २० मिनिटात पोहोचलो . कौलारू मंदिरात हनुमानची मुर्ती आणि काही वीरगळी ठेवलेल्या आहेत . या मंदिरापासून किल्ल्याच्या मध्यावर असलेल्या गुहेपर्यंत जाण्यासाठी पाउलवाट आहे असे आम्हाला वाटाड्याने सांगितले. त्याप्रमाणे पाउलवाटेला लागल्यावर १० मिनिटे चढ चढल्यावर  एका आंब्याच्या झाडाखाली आलो. येथून दोन ठळक पाउल वाटा फुटत होत्या एक उत्तर डोंगरधारेकडे तर दुसरी दक्षिण डोंगरधारेकडे जात होती . आम्ही उत्तरेकडे जाण्याऱ्या पायवाटेने निघालो. ती वाट हळूहळू चढत जात होती. पण १० मिनिटात लक्षात आले की ही वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून मागे जातेय . मग परत फिरलो आणि आंब्याच्या झाडापासून दक्षिणेस जाणाऱ्या वाटेने पुढे गेलो पण ती वाट सरळच जात होती आम्ही गुहेच्या खालून पुढे गेल्यावरही वाट वर चढेना तेंव्हा लक्षात आल की ही पण किल्ल्यावर जाण्याची वाट नाही . मग गुहेच्या खाली येउन एक छोटासा कातळटप्पा चढून  गुहेपाशी आलो. हि किल्ल्यावर जाण्याची वाट नव्हती . पण दिवसभराचा कार्यक्रम पार पाडायाचा असल्याने आमच्या पुढे पर्याय नव्हता. 

Tank on Aad Fort

आडु बाईची गुहा ही एक डोंगराच्या कातळटोपी खाली असलेली भलीमोठी नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत कातळात कोरलेला बसण्यासाठी केलेला ओटा आणि एक टाक याच मानवनिर्मित गोष्टी होत्या . गुहेपर्यंत येण्यासाठी वाट चुकल्यामुळे अर्धा तास जास्त खर्ची पडला होता . सकाळी नाश्ता न केल्याने भुकपण लागली होती . त्यामुळे गुहेत बसून नाश्ता केला आणि पाणी पिउन किल्ल्याच्या उत्तरधारेकडे निघालो. या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या त्या जपून चढून गेल्यावर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचा माथा विस्तीर्ण पसरलेला आहे. माथ्यावर पाण्याची १५ टाकी , एक तलाव आहे म्हणजे  किल्ला नांदता असेल त्याकाळी किल्ल्यावर भरपूर वस्ती असणार त्याचे अवशेष किल्ल्याच्या माथ्यावर दिसत होते. किल्ल्याचे प्रवेशद्वार सध्या उध्वस्त स्थितीत आहे . किल्ला व्यवस्थित पाहाण्यात एक तास कसा गेला ते कळलच नाही. किल्ला उतरताना प्रथम त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या . किल्ला चढताना दरीकडे पाठ असल्याने त्याची भयानकता जाणवली नव्हती. पण उतरताना तिन्ही बाजूला दरी असल्याने कातळाकडे तोंड करुन उतरायला सुरुवात केली.  पाय खालच्या पायरीवर टेकेपर्यंत हाताची पकड सोडायची नाही हा नियम पाळून जपून उतरताना तापलेल्या कातळाचे चटकेही बसायला लागले होते . किल्ला उजाडल्या उजाडल्या चढायला सुरुवात करायची हा निर्णय योग्यच होता. जपून पायऱ्या उतरून सपाटीला आलो. किल्ला चढताना हरवलेली पायवाट यावेळी अचूक सापडली . १० मिनिटात किल्ला उतरुन गावाकडे मोर्चा वळवला
यातून मिळालेला अनुभव यामुळॆ एकदा जायच नक्की केल्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता.



हि सगळी ठिकाण एका दिवसात पाहायची होती. त्यामुळे गाडी घेऊन रात्री ११ च्या सुमारस डोंबिवलीहून निघालो. कसारा घाट पार केल्यावर हवा थंड झाली, मुंबईची उकाड्यातून आल्यामुळे एकदम फ़्रेश वाटायला लागल. पहाटे ३.३० ला आड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आडवाडीत पोहोचलो. झुंजूमुंजू झाल्यावर वर जायचे होते. पण त्यासाठी अजून दोन तास बाकी होते. त्यामुळे पाठ टेकायला जागा शोधण भाग होते. गावातील शाळा, मंदिर, घरांच्या पडव्या, अंगण ही आमची नेहमीची झोपायची ठिकाण, त्या दृष्टीने शोध चालू केला. इतक्यात येवढ्या रात्रीही एक माणूस गावात फ़िरताना दिसला. त्याला विचारल्यावर त्याने जवळाच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात जायला सांगितले. श्रीकृष्णाचे मंदिर ऐसपैस होते. इथल्या पध्दतीप्रमाणे गावातले काही लोक मंदिरात झोपायला होते. आमची चाहूल लागताच काही लोक उठले आणि चौकशी चालू केली. सकाळी किल्ल्याची वाट दाखवायच एकाने मान्य केल्यावर मी आणि कौस्तुभने स्लिपिंग बॅग अंथरल्या, वैभव आणि उमेशने स्लिपिंग बॅग आणली नसल्याने त्यांनी सॅक मधून वर्तमानपत्र काढली. तितक्यात एका माणसाने त्यांना हाक मारून  उशाशी घेतलेली गोधडी दिली. या भागात दिवसा तापमान ४० अंशाच्या पुढे असले तरी रात्री मात्र व्यवस्थित थंडी असते. १२ महिने वारे वाहात असतात. त्यामुळे या भागात पवनचक्क्यांची संख्याही जास्त आहे. आम्ही झोपलेलो त्या मंदिरातही थंडगार वारा लागत होताच. पहाटेचा गजर लावून स्लिपिंग बॅगमध्ये शिरलो. दिवसभराच्या धावपळीने कधी झोप लागली कळलच नाही. अचानक नगार्याच्या आवाजाने जाग आली. काकड आरती चालू झाली होती. मागे एकदा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरात झोपलो असताना सकाळी इलेक्ट्रीकवर चालणारा ढोल आणि झांजने झोपमोड केली होती. पण आज नगारा अतिशय तालात वाजत होता आणि आरतीच्या चाली प्रमाणे त्याचा ताल बदलत होता. कुतूहलामुळे उठून बसलो. एक आजोबा समरसून नगारा वाजवत होते. आरती म्हणणाऱ्या माणसाचा आवाजही चांगला होता. पण आरतीचे शब्द मात्र मला तरी अपरिचित होते.  आमच्यातला वैभव उठून आरतीला आधीच  उभा राहीला होता. मीही गाभाऱ्या समोर जाऊन उभा राहिलो. तेंव्हा लक्षात आले की हे देउळ महानुभाव पंथांच्या लोकांचे आहे . 

Aad  Fort

आरती संपल्यावर झोपण शक्य नव्हते. मग गाववाल्यांशी गप्पा मारायला सुरुवात केली अशा गप्पांमध्ये  दंतकथा, गावचे प्रश्न, राजकारण इत्यादी अनेक गोष्टी कळतात. फक्त आपण आपला शहरी शहाणपणा आणि आगाऊपणा सोडून नम्र श्रोत्याची भुमिका घ्यायची असते आणि संवाद यज्ञ चालू ठेवण्यासाठी प्रश्नांच्या समिधा मधून मधून टाकत राहायच्या असतात. गावातली ३०० घर महानुभाव पंथाची आहेत . त्यांनीच हे श्रीकृष्णाचे मंदिर बांधले आहे .गावात दुधदुभत भरपूर आहे. एकेकाळी गावातून मोठ्या प्रमाणावर खवा सिन्नरच्या बाजारात जायचा. या भागतले उघडे बोडके डोंगर दिसतात त्याच कारण हा खवा आहे. खवा बनवण्यासाठी भरपूर सरपण लागायच त्यामुळे जंगलतोड झाली. नंतरच्या काळात पवनचक्क्या आल्या त्याबरोबर रस्ते आले, एसटी आली. आज गावात खवा बनवणार एकच घर आहे.(त्याच नाव मी गुगल मॅपवर पाहीले होते. ते त्यांना सांगितल्यावर आश्चर्य वाटले ) गावातील बाकी सर्व लोक आता दिवसातून दोनदा दुध सिन्नरच्या बाजारात घेउन जातात. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन जीप सिन्नरला जातात. गप्पा चालू असतानाच पूर्वेकडे फटफटायला लागल . त्याबरोबर आकाशाच्या पार्श्वभूमीवर पनचक्क्या फिरताना दिसायला लागल्या. गाववाल्यांकडून आम्हाला चहाचा आग्रह होत होता पण उन्हाच्या आधी आड किल्ला पाहून पुढे जायचे होते. त्यामुळे आम्ही सामान आवरून निघालो. एक गाववाला आम्हाला थोड्या अंतरापर्यंत वाट दाखवायला आला . गावाच्या बाहेर एक मातीच धरण होते . मार्च महिन्यातच त्यातला पाणीसाठा आटला होता. धरणाच्या पुढे वाट शेतातून जात होती . समोर आड किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला होता. किल्ल्याच्या उत्तर दिशेकडील डोंगरधारेच्या खाली मारुती मंदिर आहे . गावातून मंदिरापर्यंत २० मिनिटात पोहोचलो . कौलारू मंदिरात हनुमानची मुर्ती आणि काही वीरगळी ठेवलेल्या आहेत . या मंदिरापासून किल्ल्याच्या मध्यावर असलेल्या गुहेपर्यंत जाण्यासाठी पाउलवाट आहे असे आम्हाला वाटाड्याने सांगितले. त्याप्रमाणे पाउलवाटेला लागल्यावर १० मिनिटे चढ चढल्यावर  एका आंब्याच्या झाडाखाली आलो. येथून दोन ठळक पाउल वाटा फुटत होत्या एक उत्तर डोंगरधारेकडे तर दुसरी दक्षिण डोंगरधारेकडे जात होती . आम्ही उत्तरेकडे जाण्याऱ्या पायवाटेने निघालो. ती वाट हळूहळू चढत जात होती. पण १० मिनिटात लक्षात आले की ही वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून मागे जातेय . मग परत फिरलो आणि आंब्याच्या झाडापासून दक्षिणेस जाणाऱ्या वाटेने पुढे गेलो पण ती वाट सरळच जात होती आम्ही गुहेच्या खालून पुढे गेल्यावरही वाट वर चढेना तेंव्हा लक्षात आल की ही पण किल्ल्यावर जाण्याची वाट नाही . मग गुहेच्या खाली येउन एक छोटासा कातळटप्पा चढून  गुहेपाशी आलो. हि किल्ल्यावर जाण्याची वाट नव्हती . पण दिवसभराचा कार्यक्रम पार पाडायाचा असल्याने आमच्या पुढे पर्याय नव्हता. 

Tank on Aad Fort

आडु बाईची गुहा ही एक डोंगराच्या कातळटोपी खाली असलेली भलीमोठी नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत कातळात कोरलेला बसण्यासाठी केलेला ओटा आणि एक टाक याच मानवनिर्मित गोष्टी होत्या . गुहेपर्यंत येण्यासाठी वाट चुकल्यामुळे अर्धा तास जास्त खर्ची पडला होता . सकाळी नाश्ता न केल्याने भुकपण लागली होती . त्यामुळे गुहेत बसून नाश्ता केला आणि पाणी पिउन किल्ल्याच्या उत्तरधारेकडे निघालो. या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या त्या जपून चढून गेल्यावर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचा माथा विस्तीर्ण पसरलेला आहे. माथ्यावर पाण्याची १५ टाकी , एक तलाव आहे म्हणजे  किल्ला नांदता असेल त्याकाळी किल्ल्यावर भरपूर वस्ती असणार त्याचे अवशेष किल्ल्याच्या माथ्यावर दिसत होते. किल्ल्याचे प्रवेशद्वार सध्या उध्वस्त स्थितीत आहे . किल्ला व्यवस्थित पाहाण्यात एक तास कसा गेला ते कळलच नाही. किल्ला उतरताना प्रथम त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या . किल्ला चढताना दरीकडे पाठ असल्याने त्याची भयानकता जाणवली नव्हती. पण उतरताना तिन्ही बाजूला दरी असल्याने कातळाकडे तोंड करुन उतरायला सुरुवात केली.  पाय खालच्या पायरीवर टेकेपर्यंत हाताची पकड सोडायची नाही हा नियम पाळून जपून उतरताना तापलेल्या कातळाचे चटकेही बसायला लागले होते . किल्ला उजाडल्या उजाडल्या चढायला सुरुवात करायची हा निर्णय योग्यच होता. जपून पायऱ्या उतरून सपाटीला आलो. किल्ला चढताना हरवलेली पायवाट यावेळी अचूक सापडली . १० मिनिटात किल्ला उतरुन गावाकडे मोर्चा वळवला. पुन्हा श्रीकृष्ण मंदिरात पोहोचल्यावर चहाचा आग्रह झाला पण थांबलो नाही . त्यांनी दिलेले विहिरीतील थंडगार पाणी पिउन निघालो. गाडी काढणार तर समोरुन पाण्याची पिंप भरुन ट्रॅक्टर आला . उन्हाळ्याला सुरुवात झाली होती पण आत्ताच गावात पाणी टंचाई होती. गाडीने थेट ठाणगाव गाठले. मध्ये एके ठिकाणी रस्ता एका डाईक वरुन गेला . दोन्ही बाजूला दरी आणि कातळाच्या भिंतीवर बनवलेला रस्ता .


ठाणगावात मिसळ पाव आणि चहा घेउन ७ 
 
 
 
 गडाचा पहिला टप्पा पार केला व आजूबाजूस पाहिले तर आजूबाजूचा परिसर संपूर्णतः धुक्यात गडप झालेला दिसत होता. जोरदार गार वारे व त्याला जोड म्हणून कडाक्याच्या थंडीने आम्हाला पहिली सलामी दिली😍 मोबाईल मधे weather forecast वर हवेचा वेग किती असावा हे चेक केले  तर तो होता 18.3km/hr. व temp. होते 16c😳

पहिला टप्पा पार केल्यानंतर पुढील टप्पा हा डोंगर पोटाने सरळ पुढे जाऊन गड माथ्याकडे जातो.त्या मार्गे गेल्यानंतर आम्हाला एक टाके लागले नुकतेच ते टाके उकरलेले दिसत होते त्यामुळे त्यात तुडुंब भरलेले पाणी होते. टाक्याच्या थोडे पुढे गेले की एक कोरडा तलाव दिसतो त्या तलावावरून सरळ पुढे आल्यावर परत आपल्याला दोन टाके दिसतात त्याच्या अजून थोडे पुढे आलो की आपल्याला पाच-सहा टाक्यांचा समूह व टाक्यांचा वरच्या बाजूस एक  भरभक्कम अशी दगडी शिवपिंड नजरेस पडते.तिथून अजून थोडे पुढे आल्यावर आपल्यास उजव्या बाजूने एक भगवा झेंडा फडकताना दिसतो त्याच्या पूर्व बाजूने पुढे गेले की खाली उतरण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या मार्ग लागतो. त्या पायऱ्या उतरून आपण उजव्या बाजूने चालत पुढे आलो की आपल्याला एक गुहा लागते. ह्या गुहेत गडदेवता अडूमातेचे मंदिर व काही शेंदूर लावलेले अज्ञात देव दिसतात.सोबतच गुहेच्या बाजूलाच एक टाके आहे. त्यात बऱ्यापैकी स्वच्छ पाणी आहे. गड देवतेचे दर्शन घेऊन आम्ही माघारी फिरलो व कातळपायऱ्या चढून वरती येऊन पश्चिम दिशेने पुढे चालण्यास सुरुवात केली.गडावर सध्या कंबरेच्यावर गवत माजलेले आहे त्यामुळे स्पष्टपणे अशी वाट नजरेस पडत नाही पण अंदाजा अंदाजाने आम्ही एक दोन घळीच्या तोंडापर्यंत जाऊन गडावरील नाशिक दरवाजा शोधण्याच्या प्रयत्न केला. शेवटी तिसऱ्या घळेच्या पुढे आल्यावर अंशुमनला नाशिक दरवाजा नजरेस पडला! दरवाजाच्या मार्गातील दगड,माती काढून प्रशस्त असा दरवाजा आता मोकळा केला गेला आहे. पायऱ्या सुद्धा एकदम रुंद व भक्कम स्थितीत आहेत.बाजूलाच एका टाक्याचे अर्धवट असे खोदकाम केलेले आहे.(काम चालू असावे)तिथून आम्ही आजूबाजूच्या परिसरावर नजर टाकून पाहिले तर फक्त  आणि फक्त धुरकट दिसत होते म्हणजे आज फक्त गडभ्रमंतीच बाकी चौफेर परिसर पाहण्यास बंदीच होती थोडक्यात असे म्हणा ना(कराचीच्या कृपेने🤣)

आता आम्ही नाशिक दरवाजा बघून काही फोटो घेतले व परत पुढे चालत आल्यावर पाच टाक्यांचा समूह नजरेस पडला.तो पाहून आम्ही टाक्यांचा समोरच्या बाजूने आम्ही गडावरील सर्वोच्च ठिकाणी आलो तिथे एक समाधी व काही समाधीचे दगड विखरलेल्या अवस्थेत पडलेले दिसले.

गडपठार त्या मानाने भरपूर विस्तृत आहे व गडावर भरपूर टाके सुद्धा आहेत म्हणजे पूर्वी गडावर बऱ्यापैकी राबता असावा🙏🏻

सकाळच्या१०.२०वाजेच्या दरम्यान आमची गडभ्रमंती झाली होती. आज गडावर आमच्या दोघां व्यतिरिक्त कुणीही नव्हते.

https://firastya.blogspot.com/2022/01/blog-post_24.html


आड


प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ४०२८ फुट

श्रेणी : मध्यम

अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगररांगेच्या पुर्व बाजुस औंढा, पट्टा, आड,बितंगगड यासारखे किल्ले वसले आहेत. आड हा या रांगेतील शेवटचा किल्ला. या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला ठाणगाव गाठावे लागते. घोटी- भंडारदरा रस्त्यावरील टाकेद गावातून म्हैसमाळ घाटमार्गे घोटी-ठाणगाव हे अंतर ५२ किमी तर सिन्नरमार्गे ७५ कि.मी आहे. ठाणगाव ते आडच्या पायथ्याशी असलेली वरची आडवाडी हे अंतर सुमारे १० कि.मी. असून पवनचक्क्यांमुळे या सर्व भागात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. आड गावाजवळ असणाऱ्या या किल्ल्याविषयी कुणाला फारशी माहित नाही. वरच्या आडवाडीतून रस्त्याने थोडे पुढे आल्यावर एखाद्या घराप्रमाणेच दिसणारा महानुभव पंथाचा आश्रम आहे. येथुन एक रूळलेली पायवाट अर्ध्या तासात आपल्याला गडावर घेऊन जाते व तुटलेल्या तटबंदीतुन आपण गडावर प्रवेश करतो. गडावर जाण्याचा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. या शिवाय गावातून किल्ल्याकडे जाणारी अजुन एक पण थोडी दुरची वाट आहे. आडवाडीच्या बाजुने आड किल्ल्याची एक सोंड खाली गावाकडे उतरते. गावातुन आल्यास वाटेतील धरण पार केल्यावर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात येतो. या मंदिरात दोन विरगळ पहायला मिळतात. येथुन सोंडेवरून थोडा चढ चढल्यावर वाट उजवीकडे वळते आणि गावातुन तासाभरात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ४०२८ फुट आहे. गडाचा माथा एक विस्तीर्ण पठार असुन दक्षिणोत्तर साधारण ४० एकरवर पसरलेले आहे. आडवाडीच्या बाजुने गडावर जाताना या वाटेवर डाव्या बाजुला कड्यात एक नैसर्गिक विस्तीर्ण गुहा असून आत आडूबाई देवीचे मंदिर आहे. या गुहेला लागुन अजुन एक खोदीव गुहा व शेजारी पिण्याच्या पाण्याचे टाके असून गडावर मुक्काम करायचा असल्यास हि जागा योग्य आहे. येथुन उजवीकडे वळल्यावर गड माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या १०-१२ पाय-या आहेत. यातील काही पाय-या ढासळलेल्या असल्याने थोडे जपुन चढावे लागते. गडाची बरीच पडझड झाली असुन काही ठिकाणी तुरळक तटबंदी दिसते. गडाच्या माथ्यावर काही उद्‌ध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसुन येतात. यातील एका अवशेषात दगडी शिल्प असुन त्याची मोठया प्रमाणात झिज झाल्याने त्यातील शिल्प ओळखु येत नाही. या मूर्तीसमोर दिपमाळेसारखा एक मोठा दगडी दिवा ठेवलेला आहे. किल्ल्याच्या मधील उंचवट्यावर दोन वाड्यांची जोती असुन यातील एका चौथऱ्यावर समाधी आहे. याशिवाय गडाच्या पश्चिमेला अजुन एका वास्तुचे भिंतीसह अवशेष दिसुन येतात. गडावर सहा ठिकाणी पाण्याची एकुण सोळा टाकी असुन गुहेकडील एक टाके वगळता इतर पाच ठिकाणी जोडटाकी आहेत. या सर्व टाक्यात पाणी जमा करण्यासाठी खडकावर चर खोदलेले आहेत. याशिवाय गडावर एक मोठा साचपाण्याचा तलाव आहे. गडावरील पाण्याची सोय व सर्वत्र विखुरलेले अवशेष पहाता गड नांदता असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. गडावर उत्तरेकडे असलेला दरवाजा कोकण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. आज या दरवाजाची केवळ चौकट उभी असुन कमानीचे ढासळलेळे दगड आजुबाजुला विखुरलेले आहेत. किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पुर्वेला औंढा , पट्टा, बितनगड, म्हसोबा डोंगर या कळसूबाई रांगेचे दर्शन होते तर पश्चिमेला डूबेरगड दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. इतिहासात या गडाबाबत कोणत्याही नोंदी दिसून येत नाहीत. टीप - खाजगी वहानाने डुबेरगड, आड, पट्टा, औंढा आणि बितनगड हे पाच किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहुन होतात.
© Suresh Nimbalkar


आमचा प्रवास ट्रेकच्या आदल्यादिवशी सुरु झाला म्हणजे २३ जून ला आणि आम्ही २४ तारखेला किल्ले आणि वाडा एका दिवसात करणार होतो . किल्ले आटोपशीर असल्याने ते शक्य होते . दुसऱ्या दिवशी पहाटे ४ ला आमची गाडी आडवाडी ह्या किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोहोचली, आमच्या ठरलेल्या नियोजनानुसार साडेपाच वाजेपर्यंत झोपण्याची मुभा असल्याने सर्व जण गावातल्या चक्रधर स्वामींच्या मोठ्या मंदिरात एक मस्त डुलकी  काढायला पटापट स्लीपिंग बॅगा टाकून झोपू लागले, मी स्लीपिंग बॅग  काही घेऊन गेलो नव्हतो  आणि तसे पण लगेच परत उठायचे होते म्हणून मंदिरातल्या एका खांबाला टेकून शांत बसलो होतो . नंतर एका काकांनी मला झोपायची सोय करून दिली आणि मी हि मग अंग टाकले . सकाळी ५ वाजता काकड आरती मुळे जाग आली , आरती म्हणणाऱ्या व्यक्तीचा आवाज सुरेल होता आणि तो  नगारा सुद्धा छान वाजवत होता .उठून सकाळचे सोपास्कार करून  मंदिराच्या परिसरातच नाश्ता करून आम्ही सर्व ट्रेकर्सनी  आड किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

                                          आड वाडीतून सभोवतालचा दिसणारा परिसर 
ट्रेक मध्ये नेहमीप्रमाणे ओळख सत्र वगैरे झाल्यानंतर गावातल्या शेतातल्या वाटेतून आम्ही आड किल्ल्याकडे निघालो. किल्ल्यावर जात असताना प्रामुख्याने  खूप पवनचक्क्या दिसतात  मला उमेश कडून मिळालेल्या माहिती नुसार पवनचक्क्यांची हि रांग  सिन्नर पासून ते जवळ पास औंध पर्यंत  पसरली आहे . किल्ल्याची वाट  सोपी आहे , पण तरीही प्रथम जात असेल तर वाटाड्या घेऊन जावे. वाटेत आपल्याला पहिले मारुतीचे मंदिर लागते , मारुती मंदिराच्या मागून आपल्याला समोरच  डुबेरा  किल्ला दिसतो.

                                          मारुती मंदिराच्या मागून दिसणारा डुबेरा  किल्ला 
इथून पुढे साधारण २० मिनिटात आपण गडमाथ्यावर प्रवेश करण्याआधी एक गुहा लागते तिला आडूबाईची  गुहा म्हणतात. ह्या गुहेत देवीच्या २ मुर्त्या आहेत.इथून पुढे १० कातीव पायऱ्या चढून आम्हाला गडमाथा गाठायचा होता पण पायऱ्यांच्या  उजव्या बाजूला काही आधार नसल्याने सुरक्षितता म्हणून आमच्याबरोबर एक्स्पर्ट टीम होती जी रोप लावण्यासाठी पुढे गेली त्यामुळे आम्ही काही ट्रेकर्स नि २० मिनिटाचा अराम केला. थोड्याच वेळात आम्ही सर्व जण एक एक करून पायऱ्यांचा पॅच चढून माथ्यावर पोहोचलो . मी पण 
सेफ्टी म्हणून रोप लावली. पॅच चढुन  गडमाथ्यावर आल्यावर सिन्नर चा परिसर आणि पवनचक्क्यांची रांग आपले लक्ष वेधून घेते. आम्ही गड फेरी सुरु केली गडावर अवशेष म्हंटले तर फारसे तसे नाहीत  , पण ह्या किल्ल्यावर वास्तव्य मात्र हमखास असणार हे गडावर असणाऱ्या १० ते १५ टाक्यांवरून दिसते . आणि विशेष म्हणजे एका टाक्यावर शरभ शिल्प होते जे बहुधा मी गडावरील दरवाजे अथवा तटबंदीवर ह्या आधी  पाहिले आहे .

                                                              गडावरील पाण्याची टाकी  

                                                             शरभ शिल्प  असलेले टाके 
नंतर गडाच्या उजवीकडून आपल्याला समोर बितनगड, अवंधा , आणि पट्टा हे गड दिसतात . थोडे पुढे चालत गेल्यावर उध्वस्त प्रवेशद्वार पाहायला मिळते त्याच्या कमानी आणि बुरुज  पूर्णपणे ढासळले आहेत . अशा प्रकारे गडफेरी पूर्ण करून आता पायऱ्यांच्या वाटेने सावकाश उतरायचे ह्या विचाराने चालू लागलो पण इथेच मात्र एक कहाणी मे ट्विस्ट आला आणि आम्हाला पर्याय दिला गेला कि आल्या पायऱ्यांच्या वाटेने  उतरून जायचे किंवा रॅपलिंग करून गुहेच्या जवळ उतरायचे मग काय भीती असली तरी रॅपलिंग चा पर्याय निवडला कारण ते करायचे होतेच शिवाय एक्स्पर्ट असल्याने ते सेफ हि होते . पहिली वेळ असल्याने मी घाबरलो नक्की पण रॅपलिंग करून खाली उतरलो आणि तो माझा अनुभव भन्नाट होता ,ह्या अनुभवाचाच फायदा मला आता पुढे होणार आहे .

                                                                  उध्वस्त  प्रवेशद्वार 

                                                                 पहिल्यांदा रॅपलिंग 

रॅपलिंग नंतर परत आम्ही गड उतरून  साधारण २० मिनिटात आडवाडीत आलो आणि  मंदिरातच जेवायचे ठरवले. पोटोबा झाल्यानंतर मग आम्ही निघालो बर्व्यांचा वाडा पाहण्यासाठी डुबेरा गावाकडे .
साधारण दुपारच्या २ च्या सुमारास आम्ही बर्व्यांच्या वाड्यात प्रवेश केला.राधाबाई म्हणजेच थोरले बाजीराव पेशव्यांच्या आई ह्या माहेरपणाला येथे आल्या होता असे म्हंटले जाते (राधाबाईंचे माहेरचे आडनाव बर्वे असे होते).

https://rockpachh.wordpress.com/2018/07/06/%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a1-%e0%a4%a1%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

 आड किल्ल्यावर जाण्यासाठी आधी ठाणगावात पोहचावे लागते. तेथुन डावीकडचा रस्ता पट्टावाडीकडे तर उजवीकडचा सरळ रस्ता आड किल्ल्याकडे घेऊन जातो.

प्रचि १०

प्रचि ११

आडच्या रस्त्यावर सुझलॉन कं.च्या पवनचक्क्यांची रांगच रांग दिसते. इतक्या होलसेल मधे पवनचक्क्या असुनही हवेतील उष्मा जिव काढतो. ठाणगांवातुन ६ कि.मी. चा घाट रस्ता चढुन वर आल्यावर आडचा किल्ला दिसतो.

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

किल्ला आकाराने मोठा असला तरी चढाईला अगदीच सोप्पा आहे. किल्लावर हिरवं गवत आणि पाण्याच टाकं असल्या मुळे गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसला. ठिकठिकाणी पाचर मारुन पावसाच पाणी मुरवण्याच तंत्र इथे अवलंबलेलं दिसलं.

प्रचि १४

किल्ल्यावर घारांची जोती आणि तुरळक अवशेष वगळाता विशेष काहीच नाही. किल्ल्या वरुन वायव्येला डुबेर अगदी हाकेच्या अंतरावर दिसतो. तर मागे पश्चिमेला आभाळात घुसणारी औंढ्याची लिंगी दिसते.
खाली दरित पवनचक्क्यांच साम्राज्य पसरलेलं दिसतं.

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८ अबतक ९७

प्रचि १९ उडी

प्रचि २०

खाली उतरताना उन्हाने अंग भाजुन निघत होतं. पायथ्याला आल्यावर मंडळी विहिरीवर जाउन ताजीतवानी झाली. एव्हाना साडे अकरा वाजत आले होते... आता पुढचं लक्ष होतं पट्टा!!! 























No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...