Wednesday, July 12, 2023

मोरधन किल्ला

गडकिल्ले फिरताना काही डोंगरावर आपल्याला या डोंगराला किल्ला का म्हणावे असा प्रश्न पडतो. कारण त्या डोंगरावर किल्लेपणाची खुण दाखवणारे ना तटबुरुज ना कोणती वास्तु. असलेच तर एखादे बुजलेले टाके व एक दोन घराचे अवशेष. मग अशा ठिकाणी तंगडतोड करत जायचे तरी कशाला तर याला उत्तर एकच ते तिथे आहेत म्हणुन. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे घोटीजवळील खैरगावचा मोरधन किल्ला. नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी कल्याण,सोपारा, डहाणु बंदरात आलेला माल विविध घाटवाटांनी या बाजारपेठेत येत असे. यातील काही पूरातन घाटमार्ग, उदाहरणार्थ कसार्‍याचा "थळ" घाट, "त्र्यंबक" घाट हे आजही वापरात आहेत. तर काही घाटवाटा काळाच्या ओघात आता विस्मरणात गेलेल्या आहेत. त्याचपैकी एक असलेल्या "शिर"घाटावर नजर ठेवण्यासाठी मोरधन व कावनई किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी किनार्‍याजवळ , घाटमार्गावर व घाटावर किल्ले बांधून संरक्षणाची साखळी तयार केली जात असे. डहाणू, तारापूर या बंदरांवर किल्ले होते, त्यानंतर घाटमार्गावर भूपतगडचा किल्ला व घाटमाथ्यावर मोरधन व कावनईची संरक्षणासाठी योजना करण्यात आली होती.⁣ ⁣शिवाजी महाराजांनी इ.स. १६७०-७१ च्या आसपास त्रिंगळवाडी सोबत मोरधन किल्ला जिंकला.सन १६८८-८९ मध्ये मोघलांनी कवनी, हरिशगड, मदनगड, मोरदंत असा उल्लेख मातबरखानाने आपल्या पत्रात केला आहे.हा मोरदंत म्हणजेच मोरधन गड. 
     खैरगाव हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन मुंबई-नाशीक महामार्गावरील घोटी-शिर्डी रस्त्याने देवळे फाट्यावरून हे अंतर १३५ कि.मी.आहे. देवळे फाट्यावरून खैरगावकडे जाताना डाव्या बाजुला एक पाणबुडीच्या आकाराचा डोंगर नजरेस पडतो तोच हा मोरधन किल्ला. खैरगावात हा किल्ला मोराडोंगर म्हणून ओळखला जातो. मोरा डोंगराच्या पठारावर असलेला दुसरा डोंगर म्हणजे मोरधन किल्ला आहे. मोरा डोंगराचे पठार अस्ताव्यस्त पसरलेले असुन त्यावरील किल्ल्याचा डोंगर मात्र आकाराने लहान व निमुळता आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला हे दोन्ही डोंगर चढुन पठार तुडवत जावे लागते.
मोरा किंवा मोरधन डोंगराच्या पठारावरून मोरधन गडाचा काढलेला फोटो.  गड उत्तरदक्षिणेला  लांब पसरलेला दिसतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
१) रस्त्याने: मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबई पासून १२८ किमी अंतरावर घोटी गाव आहे. घोटी गावातून घोटी - सिन्नर रस्ता जातो. या रस्त्यावर घोटी पासून ४ किमी अंतरावर देवळे गाव आहे. देवळे गावातून उजव्या बाजूचा रस्ता २ किमी वरील किल्ल्याच्या पायथ्याच्या खैरगावात जातो.
२) रेल्वेने:
अ) मुंबईहून सकाळी ५.२९ वाजता ( ठाणे - ५.५९ , कल्याण - ६.२० ) निघणारी मुंबई - भुसावळ पॅसेंजर (५११५३ डाऊन /५११५४ अप) गाडी पकडावी, ही गाडी १०.०० वाजता घोटी स्थानकात पोहोचते. येथून बस स्टॅंडला येऊन रिक्षा किंवा जीपने खैरगावात जाता येते. मुंबईला परत येण्यासाठी भुसावळ - मुंबई पॅसेंजर दुपारी २.०० वाजता आहे.
ब) मुंबईहून रेल्वेने कसारा गाठावं. कसार्‍याहून जीप किंवा बसने घोटी गाठावं. घोटी बस स्टॅंडवरून रिक्षा किंवा जीपने खैरगावात जाता येते. घोटी स्थानकातून खैरगाव साठी एसटी नाही. त्यासाठी शेअर गाडीने किंवा खाजगी रिक्षा करून जायला लागते. किंवा एसटीने देवळे गावात उतरून खैरगाव साठी शेअर किंवा रिक्षाने जावे. घोटी ते खैरगाव अंतर अंदाजे ५ते ६ किमी असेल
३) पुण्यातून 
  पुणे-नाशिक रस्त्यावरील बोटा – ब्राम्हणवाडा – कोतूळ – धामणगाव पाट – राजूर – भंडारदरा या मार्गे कळसूबाईच्या पायथ्याच्या बारीवरुन घोटी गावच्या दिशेने निघाल्यावर अलीकडे आहे देवळे गाव. गावाजवळ दारणा नदीचा मोठ्ठा पूल लागायच्या आधी डावीकडे ‘खैरगाव’ कडे वळायचे. खैरगाव हे पायथ्याचे गाव. पुण्यापासून हे अंतर आहे २०५ कि.मी.
  • मुंबई ते कसारा लोकल ट्रेन ने कसारा उतरावे 
  • कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे. त्यासाठी शेअर गाडी असतात. प्रत्येकी ३० रुपये घेतात. 
  • किंवा भुसावळ पॅसेंजर घोटी ला १० वाजता पोहचते. हा प्रवास शेअर गाडी पेक्षा उत्तम पडेल. 
  • घोटी ते खैरगाव अंतर ५ते ६ किमी आहे. 
  • घोटी वरून खैरगाव साठी शेअर गाडी भेटतात किंवा खाजगी रिक्षा करून जाणे. 
  • स्वतःची गाडीने  मुंबई ते नाशिक महामार्गावरून घोटीला, घोटी -शिर्डी रस्त्याने देवळे गावातून खैरगाव गाठावे.

00_MoKaTri_Map_DiscoverSahyadri.jpg
देवळे फाट्यावरून खैरगावकडे जाताना डाव्या बाजुला एक पाणबुडीच्या आकाराचा डोंगर नजरेस पडतो तोच हा मोरधन किल्ला. खैरगावात हा किल्ला मोराडोंगर म्हणून ओळखला जातो. मोरा डोंगराच्या पठारावर असलेला दुसरा डोंगर म्हणजे मोरधन किल्ला आहे. मोरा डोंगराचे पठार अस्ताव्यस्त पसरलेले असुन त्यावरील किल्ल्याचा डोंगर मात्र आकाराने लहान व निमुळता आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला हे दोन्ही डोंगर चढुन पठार तुडवत जावे लागते. 

This is where we stayed that night
किल्ल्यावर जाणारी वाट गावातील भैरवनाथ मंदिराकडून असुन या मंदिराच्या आवारात उघडयावर एक शेंदूर फासलेली गणेशमुर्ती व शेजारी भग्न शिवलिंग व नंदी दिसुन येतो. 
पठाराकडे जाताना गावापासुन काही अंतरावर डाव्या बाजुला झाडीत एका समाधीचे अवशेष (थडे) दिसुन येतात. गडाखालील पठारावर गावकरी शेळ्या-गुरे चरायला नेत असल्याने वाट मळलेली पण डोंगराच्या कातळकड्यापर्यंत चांगलीच घसाऱ्याची आहे. गावा मागे पसरलेल्या मोरा डोंगराच्या मागे एक कातळटोपी घातलेला डोंगर दिसतो तोच "मोरधन किल्ला" होय. किल्ल्यावर जाण्यासाठी समोरच्या डोंगराच्या कातळ कड्याच्या खाली पोहचावे,मोरधन गडाची किंवा मोरा डोंगराची एक सोंड गावाचा दिशेने आलेली दिसते. 

ह्या डोंगराच्या वर आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर दिसतो. पहिल्याप्रथम कळतच नाही वाट कुठे आहे. पण सुरुवातीचा घसारा पार करून गेल्यावर छोटी पायवाट दृष्टीस पडते. सोंडेवरील ह्या वाटेने आपण, न चुकता डोंगर चढायला लागतो. वर चढल्यावर वाट डावीकडे वळत डोंगराची घळ लागते, तिथे घेऊन जाते.


Mordhan trek blog : route from Khairgaon
 

The couloir route of Mordhan from Pimpalgaon
कातळकड्याला वळसा घालत हि वाट दोन डोंगरांच्या घळीतून वर पठारावर जाते. पठारावरून एक वाट सरळ पुढे जाताना दिसते. पण गडावर जाण्यासाठी वाटेने सरळ पुढे न जाता, आपल्या उजव्या बाजूला जेथे मोरधन गडाचा मुख्य शिखर सुरवात होतो. तिथूनच बरोबर खाली वाट आहे, हे लक्षात ठेवणे. कारण पठारावरून येणारी मोठी वाट सरळ पुढे जाते, त्यामुळे उजव्याबाजूची हि छोटी वाट दिसत नाही. त्यामुळे चुकून तुम्ही सरळ जाणाऱ्या वाटेने पुढे जाऊन चुकू शकता.
Mordhan Fort Trek Route - How to reach Mordhan fort Route from Khairgaon , Ubhadewadi , Pimpalgaon
 येथून कातळ कड्याला वळसा घालून पायवाट दोन डोंगरांच्या घळीतून वर पठारावर जाते. पावसाळ्यात या घळीतून ओढा वहात असतो.
पठारावर प्रवेश करताना असलेल्या खिंडीत काही चौकीवजा अवशेष दिसुन येतात. पायथ्यापासुन पठारावर येण्यास साधारण दिड तास लागतो. पठारावर आल्यावर समोरच मोरधन किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला निमुळता डोंगर दिसतो तर डाव्या बाजुला निमुळते झालेल्या पठारावर भगवा झेंडा फडकताना दिसतो.
Mordhan Fort Trek Route - How to reach Mordhan fort Route from Khairgaon , Ubhadewadi , Pimpalgaon


 किल्ल्याखाली पठाराच्या दुसऱ्या टोकाला एका झाडावर भगवा फडकताना दिसतो. या ठिकाणी एक मंदिर व आश्रम असुन तेथे दोन लहान झरे आहेत. यातील एका झऱ्याचे पाणी पिण्यायोग्य असुन दुसऱ्या झऱ्यातील पाणी पठारावर आलेली गुरे पितात. किल्ल्यावर जाण्यासाठी पठारावरून एक वाट किल्ल्या़चा डोंगर उजवीकडे ठेऊन तिरकस वर चढत जाते. हि वाट ओळखण्याची खुण म्हणजे या वाटेच्या वरील बाजुस एक कपार आहे 
mordhan fort trek blog: The shepherd of the land @ Mordhan fort trek
अन्यथा पठारावर मोठया प्रमाणात गुराखी असतात त्यांना वाट विचारावी. या वाटेच्या शेवटच्या टप्प्यात घसरून आलेले तटबंदीचे घडीव दगड मोठया प्रमाणात दिसुन येतात. पठारावरून गडमाथ्यावर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. 
04_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

The route from plateau 1 to plateau 2 of Mordhan

 पठारावरून एक वाट सरळ पुढे जाताना दिसते. पण गडावर जाण्यासाठी वाटेने सरळ पुढे न जाता, आपल्या उजव्या बाजूला जेथे मोरधन गडाचा मुख्य शिखर सुरवात होतो. तिथूनच बरोबर खाली वाट आहे, हे लक्षात ठेवणे. कारण पठारावरून येणारी मोठी वाट सरळ पुढे जाते, त्यामुळे उजव्याबाजूची हि छोटी वाट दिसत नाही. त्यामुळे चुकून तुम्ही सरळ जाणाऱ्या वाटेने पुढे जाऊन चुकू शकता. 
Just chilling on the huge plateau
या वाटेच्या शेवटच्या टप्प्यात घसरून आलेले तटबंदीचे घडीव दगड मोठया प्रमाणात दिसुन येतात. पठारावरून गडमाथ्यावर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. समुद्रसपाटीपासून गडाची उंची ३५१० फुट असुन निमुळता माथा असलेला हा गड दक्षिणोत्तर साधारण ८ एकरवर पसरलेला आहे.

गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर उजवीकडचा माथा जवळ आणि लहान असल्यामुळे आधी त्यादिशेला जायचे.  येथुन गडाच्या दुसऱ्या टोकाकडे जाताना वाटेत अलीकडे बांधलेले काही सिमेंट चौथरे दिसुन येतात. येथे खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे पण सध्या ते मातीने भरलेले आहे. वाटेत पुढे खडकात खोदलेला एक रांजण (बळद) असुन त्याच्या पुढील भागात काही घरांचे अवशेष दिसुन येतात. वाटेच्या पुढील भागात डाव्या बाजुला एका वाड्याचे अवशेष असुन उजव्या बाजुला एक साचपाण्याचा पण सध्या मातीने भरलेला तलाव दिसतो. गडमाथ्याच्या टोकाला पहाऱ्याच्या चौकीचे अवशेष दिसतात. ह्या बाजूला माथ्यावर बाकी काही अवशेष नसल्यामुळे, पाठीमागे फिरून डावीकडे जायचे. डावीकडील माथा दक्षिणेला लांबवर पसरलेला आहे. ह्या बाजूला तुम्ही गडमाथ्यावर ज्या वाटेने येतात.  त्याचा डाव्या बाजूला, काही अंतरावर गडावरील एकमेव पाण्याचे टाके लागते. टाकीच्या पुढे दक्षिणेला गड माथा अजून लांब पसरलेला आहे. पण टाकीच्या पुढील माथ्यावर काही अवशेष नाहीत. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला असून त्याची रुंदी कमी आहे. गड माथ्यावर दक्षिणेला व उत्तरेला एक पाण्याच टाक व घराच जोत आहे. दक्षिणेकडील टाक्याच्या काठावर देवाची बैठक आहे. एका दंतकथे नुसार आज नाशिक जवळ असलेली पांडवलेणी देव या डोंगरावर एका रात्रीत खोदणार होते. पण टाक खोदून झाल्यावर अवेळी (रात्रीच) कोंबडा आरवला. त्यामुळे देवांना वाटले सकाळ झाली आणि ते मोरा डोंगर सोडून पुढे गेले. देवांनी टाक्याच्या काठावर जिथे विश्रांती घेतली , त्या जागी कातळाला विशिष्ट आकार आलेला आहे. त्याला स्थानिक लोक देवाची बैठक म्हणतात. गडाखाली पठारावर केवळ एका ठिकाणी झऱ्याचे पाणी पिण्यासाठी असल्याने पाणी सोबत बाळगावे. 
09_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

गडमाथ्यावर भन्नाट वारा असतो. गडमाथ्यावरून पूर्वेला कळसूबाईच डोंगर, अलंग, मदन, कुलंग हे किल्ले दिसतात. उत्तरेला कावनई किल्ला व त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. तसेच नांदगाव धरणाचा कॅचमेंट एरीया गडावरून दिसतो.किल्ल्याचे स्थान व यावरील अवशेष पहाता मोरधन किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी झाला असावा.मोरधन किल्ला नाशिकचे दुर्गअभ्यासक श्री. गिरीश टकले यांनी शोधला. मुघलकालीन पत्रांत याचा मोरदंत म्हणून उल्लेख येतो. 
  गडावर रहाण्याची सोय नाही. खैरगावातील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकते.गडावर किंवा खैरगावात जेवणाची सोय नाही. घोटी येथे जेवणाची सोय आहे.खैरगावातून मोरधन किल्ल्यावर जाण्यासाठी २ तास लागतात.

संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
३) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
४) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे]
५) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
६) www.durgbharai.in  हि वेबसाईट
७)  https://kunalstrek.blogspot.com/2018/08/blog-post.html, https://www.thefreebird.net/blog/mordhan-fort-trek   हे ब्लॉग

















मोरधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
  

ह्या वर्षीच्या पावसाळ्यातील हा पाचवा ट्रेक होता. पण ह्या अगोदरचा ट्रेकपेक्षा ह्या ट्रेकला मिळालेला पावासाचा अनुभव आणि गड माथ्यावर लागणारा जोराचा वारा, ढगांचा खेळ, खूप सुंदर होता. गडावरील अवशेष पाहता, हा टेहळणीचा  किल्ला असल्याचे कळून येते.

प्रवासाचे वर्णन:
शुक्रवारी रात्री आमचा, रविवारी १२ ऑगस्टला मोरधन करायचा ठरल्यामुळे, आम्हाला एक्सप्रेस ट्रेनची तिकीट भेटली नाही. त्यामुळे आम्ही कसारा लोकलने जायच ठरवले. मी सकाळी ५. १२ ची कसारा पकडली, प्रणव आणि विनय डोबवलीला भेटले. ७. ४० ला आम्ही कसारा पोहचलो. तिथेच आम्ही नाश्ता करून. कसारा स्थानकातून शेअर गाडीने अर्ध्यातासात घोटीला पोहचलो.
कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे, त्यासाठी गाडीवाले प्रत्येकी ४० रुपये घेतात. पण तो अर्धातासाचा प्रवास अनुभवून, भुसावळ पॅसेंजरने सरळ घोटीला आलो असतो तर परवडलं असत. असे मला वाटत होते. घोटी स्थानकातून खैरगाव साठी एसटी नाही. त्यासाठी शेअर गाडीने किंवा खाजगी रिक्षा करून जायला लागते. किंवा एसटीने देवळे गावात उतरून खैरगाव साठी शेअर किंवा रिक्षाने जावे. घोटी ते खैरगाव अंतर अंदाजे ५ते ६ किमी असेल. त्यासाठी रिक्षावाल्यालाने आम्हाला ३०० रुपये घेऊन जरा लुबाडलच, हे प्रवास केल्यानंतर आम्हाला कळून आले. येतेवेळी आम्ही गावातीलच एकाचा गाडीने आलो त्याने १५० रुपये घेतले. पण जर शेअर गाडीने आलो असतो, तर अंदाजे प्रत्येकी २० ते ३० रुपये घेत असतील. असा माझा अंदाज आहे.

गडाच्या वाटेच वर्णन:
सव्वा दहा वाजता आम्ही खैरगावातील शाळेजवळून ट्रेकला सुरवात केली. शाळेजवळ वाटेत मध्येच झाडाखाली उघड्यावर गणपतीची थोडी प्राचीन अशी मूर्ती दिसते. तिथून पुढे, गावातून आम्ही वाट विचारत ५ मिनटात, गावाचा पाठीमागे बाहेर आलो.

गावातून  बाहेर गडाचा दिशेने आलो असता. मोरधन गडाची किंवा मोरा डोंगराची एक सोंड गावाचा दिशेने आलेली दिसते. ह्या डोंगराच्या वर आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर दिसतो. सोंडेवरील ह्या वाटेने आपण, न चुकता डोंगर चढायला लागतो. वर चढल्यावर वाट डावीकडे वळत डोंगराची घळ लागते, तिथे घेऊन जाते.  इथून आपण ५ ते १० मिनटात डाव्याबाजूचा पठारावर पोहचतो.

मोरा किंवा मोरधनच्या डोंगराचा पठार:
आम्ही तासाभरात पठारावर पोहचलो. पठारावरून आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर सरळ उत्तर दक्षिणेला लांब पसरलेला दिसतो. तसेच पठारावरून पलीकडील दरणा जलाशय दिसतो. सुसाट सुटलेल्याला वारा आणि पावसाचा थोडावेळ आनंद घेऊन, आम्ही गडावर जाण्यासाठी पुढे चालू लागलो.

पठारावरून गडामाथ्यावर जाणारी वाटेचे वर्णन:
पठारावरून एक वाट सरळ पुढे जाताना दिसते. पण गडावर जाण्यासाठी वाटेने सरळ पुढे न जाता, आपल्या उजव्या बाजूला जेथे मोरधन गडाचा मुख्य शिखर सुरवात होतो. तिथूनच बरोबर खाली वाट आहे, हे लक्षात ठेवणे. कारण पठारावरून येणारी मोठी वाट सरळ पुढे जाते, त्यामुळे उजव्याबाजूची हि छोटी वाट दिसत नाही. त्यामुळे चुकून तुम्ही सरळ जाणाऱ्या वाटेने पुढे जाऊन चुकू शकता.

उजव्याबाजूची हि वाट, डावीकडे वर नागमोडी वळून सरळ न चुकता गडावर घेऊन जाते. ह्या वाटेने आपण  पाऊण ते एक तासात गडाच्या माथ्यावर पोहचतो.

गड माथ्यावरील वर्णन:
गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर, आम्ही उजवीकडचा माथा जवळ आणि लहान असल्यामुळे. पहिलं त्यादिशेला गेलो. उजव्या माथ्याचा टोकाला, आपल्याला एक चौथऱ्याचे अवशेष आढळतात.  ह्या बाजूला माथ्यावर बाकी काही अवशेष नसल्यामुळे, आम्ही पाठीमागे फिरून डावीकडे गेलो.

डावीकडील माथा दक्षिणेला लांबवर पसरलेला आहे. ह्या बाजूला तुम्ही गडमाथ्यावर ज्या वाटेने येतात.  त्याचा डाव्या बाजूला, काही अंतरावर गडावरील एकमेव पाण्याचे टाके लागते. टाकीच्या पुढे दक्षिणेला गड माथा अजून लांब पसरलेला आहे. पण आम्ही वाचलेल्या माहितीनुसार टाकीच्या पुढील माथ्यावर काही अवशेष नाहीत. म्हणून आम्ही इथूनच मागे फिरून गड उतरायला सुरवात केली.

तसेही गडमाथ्यावर आलेले ढग आणि गवतामुळे अवशेष ओळखणे जरा अवघडच होते. त्यामुळे आमचा चुकून एकाद-दुसरा अवशेष राहून गेले असतील.

थोड्यावेळा साठी माथ्यावरून ढग बाजूला झाल्यामुळे गडा खालील परिसर दिसू लागला. गडाचा पश्चिम बाजूला आपल्या खैरगाव, घोटीचा परिसर दिसतो. पूर्वेला दरना जलाशयचा सुंदर परिसर सतत दिसतो. ढगांमुळे आम्हाला गडावरून आजूबाजूच्या परिसरातील किल्ले दिसले नाहीत. गडावर पाऊस आणि जोराचा वारा लागत होता. वारा एवढ्या जोरात वाहत होता, कि मध्येच आम्हाला त्याचा प्रवाहात ढकलत होता. त्यामुळे आम्ही जास्त करून गडाचा कडेला जाणे टाळले. 


थोडक्यात प्रवासाबद्दल 
  • मुंबई ते कसारा लोकल ट्रेन ने कसारा उतरावे 
  • कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे. त्यासाठी शेअर गाडी असतात. प्रत्येकी ३० रुपये घेतात. 
  • किंवा भुसावळ पॅसेंजर घोटी ला १० वाजता पोहचते. हा प्रवास शेअर गाडी पेक्षा उत्तम पडेल. 
  • घोटी ते खैरगाव अंतर ५ते ६ किमी आहे. 
  • घोटी वरून खैरगाव साठी शेअर गाडी भेटतात किंवा खाजगी रिक्षा करून जाणे. 
  • स्वतःची गाडीने  मुंबई ते नाशिक महामार्गावरून घोटीला, घोटी -शिर्डी रस्त्याने देवळे गावातून खैरगाव गाठावे.

 https://kunalstrek.blogspot.com/2018/08/blog-post.html

मोरधन (Mordhan)⁣ किल्ल्याची ऊंची :  3480⁣ किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग⁣ डोंगररांग: मोरा डोंगर⁣ जिल्हा : नाशिक⁣ श्रेणी : मध्यम⁣ पूरातन काळापासून नाशिक ही मोठी बाजारपेठ होती. डहाणू, तारापूर, सोपारा , कल्याण या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत येत असे. यातील काही पूरातन घाटमार्ग, उदाहरणार्थ कसार्‍याचा "थळ" घाट, "त्र्यंबक" घाट हे आजही वापरात आहेत. तर काही घाटवाटा काळाच्या ओघात आता विस्मरणात गेलेल्या आहेत. त्याचपैकी एक असलेल्या "शिर"घाटावर नजर ठेवण्यासाठी मोरधन व कावनई किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी किनार्‍याजवळ , घाटमार्गावर व घाटावर किल्ले बांधून संरक्षणाची साखळी तयार केली जात असे. डहाणू, तारापूर या बंदरांवर किल्ले होते, त्यानंतर घाटमार्गावर भूपतगडचा किल्ला व घाटमाथ्यावर मोरधन व कावनईची संरक्षणासाठी योजना करण्यात आली होती.⁣ ⁣ खैरगाव या छोट्याश्या वस्तीच्या उशाशी असलेल्या डोंगररांगेवर एकेकाळी मोरांचा वावर होता त्यामुळे हा डोंगर आजही मोरा डोंगर म्हणून ओळखला जातो. मोरा डोंगराच्या सर्वोच्च टोकावर मोरधन किल्ला आहे. या किल्ल्याचे स्थान व यावरील अवशेष पहाता मोरधन किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी झाला असावा.⁣ ⁣ 👀पहाण्याची ठिकाणे :⁣ खैरगावातील तिठ्यावर उतरल्यावर गावात शिरणार्‍या रस्त्याने २ मिनिटात आपण शाळेजवळ पोहोचतो. येथे एका चौथर्‍यावर आभाळाखाली गणपतीची शेंदुर लावलेली मुर्ती ठेवलेली आहे. गजानना दर्शन घेऊन मोरा डोंगराच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. गावा मागे पसरलेल्या मोरा डोंगराच्या मागे एक कातळटोपी घातलेला डोंगर दिसतो तोच "मोरधन किल्ला" होय. किल्ल्यावर जाण्यासाठी समोरच्या डोंगराच्या कातळ कड्याच्या खाली पोहचावे, येथून कातळ कड्याला वळसा घालून पायवाट दोन डोंगरांच्या घळीतून वर पठारावर जाते. पावसाळ्यात या घळीतून ओढा वहात असतो. पठारावर आल्यावर उजव्या बाजूला मोरधन किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला डोंगर दिसतो. पायथ्याच्या खैरगावातून पठारावर पोहोचण्यासाठी साधारणपणे दिड तास लागतो. पठाराच्या दक्षिण टोकाला झर्‍याच्या काठी मंदिर व आश्रम आहे.⁣ ⁣ पठारावरून किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्या़चा डोंगर उजवीकडे ठेऊन डोंगरावर चढणारी वाट पकडावी. साधारणपणे ३० मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला असून त्याची रुंदी कमी आहे. गड माथ्यावर दक्षिणेला व उत्तरेला एक पाण्याच टाक व घराच जोत आहे. दक्षिणेकडील टाक्याच्या काठावर देवाची बैठक आहे.

swarajya.rakshak

swarajya.rakshak

swarajya.rakshak

swarajya.rakshak 

 swarajya.rakshak

 

 

 

 


ट्रेकचा Plan – B ठरला. सह्याद्री घाटमाथ्याजवळ इगतपुरीचं दुर्ग-त्रिकुट: मोरधन – कावनई – त्रिंगलवाडी!
रोड-टच आणि सुटावलेल्या डोंगरांवर हे किल्ले असल्यामुळे, उन्हांत जितकं जमेल तितकंच करू; असं ठरवून साकेत अन् मी शनिवारी संध्याकाळी इंडिकामधून कूच केलं. कार आहे, की ‘टूरिस्ट-गिरी’ सुरू. अंथरुण – पांघरूण – संदर्भ पुस्तकं - तहानलाडू – भूकलाडू – पायताण, असं सग्गळं सामान सुट्ट सुट्ट करत संसारंच सोबत घेतला.
01_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

..पुणे – नाशिक लघुमार्गावर धीम्या वाहतुकीनं वैताग आणला. पण आळेफाट्यापुढच्या बोटा गावाजवळ खास पसंतीच्या ढाब्यावर शेवभाजी – अख्खां मसूर – शेवग्याच्या शेंगांची भाजी - बाजरीची भाकरी ‘ये-दबाके’ चेपल्यावर, मग कुठे ‘आपण ट्रेकला निघालोय’, असं वाटायला लागलं. पहिल्यांदा वळणां-वळणांचा साधा मार्ग, मग राज्यमार्ग अन् मग राष्ट्रीय महामार्ग अश्या नाना प्रकारच्या रस्त्यांवर बोटा – ब्राम्हणवाडा – कोतूळ – धामणगाव पाट – राजूर – भंडारदरा अशी गाडी बुंगवत कळसूबाईच्या पायथ्याशी गाडीला ब्रेक मारला. अष्टमीच्या चांदण्यात कळसूबाईची उंची धूसर जाणवत होती. कळसूबाई फोटुत सापडेना..
02_MoKaTri_DiscoverSahyadri.jpgमोरधन
इगतपुरीच्या दुर्ग-त्रिकुटात ‘मोरधन’ सर्वात खड्या चढाईचा अन् घसा-याचा, म्हणून ठरवलं नमनाला दर्शन घेऊ ‘मोरधन’चं. घोटी गावच्या अलीकडे आहे देवळे गाव. गावाजवळ दारणा नदीचा मोठ्ठा पूल लागायच्या आधी डावीकडे ‘खैरगाव’ कडे वळलो. वाजले होते रात्रीचे १२:३०. पुण्यापासून २०५ कि.मी. मारुती मंदिराच्या चौथ-यावर मंद झुळूका अंगावर घेत, चांदण्या निरखत पडलो. उन्हं चढायच्या आत जास्तीत जास्त अंतर कापण्याच्या दृष्टीनं पहाटे ६ वाजताचं कूच केलं. मोरधनचं पहिलं दर्शनचं मोहवणारं होतं. दोन टप्प्यांत तीव्र घसा-यावरून चढाई असणार होती.
03_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

कातळकडा टाळून आडवं गेल्यावर खैरगावचं अन् दारणा खो-याचं सुंदर दृश्य पाठीमागे होतं.

मोरधनचा कातळमाथा कोवळ्या उन्हांत सोनेरी उजळला होता. डावीकडून वळसा घालून समोरच्या बेचक्याकडे चढत जाणारी वाट आहे. सरळ जाणा-या वाटेच्या ‘मोहा’त खरंतर उगाचच फसलो, अन् वाट चुकली!!!
06_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

चुकल्या वाटेचा निर्णय निभावून न्यायचाच, या हट्टामुळे थेट माथ्याकडे घुसत गेलो. नेहेमीप्रमाणे ‘सुरक्षित ट्रेकींगची तत्त्वं’ यावर ग्यान-सत्र पाजळलं. अर्थातंच, भीषण घसारा अन् ठिसूळ कातळ यांच्याशी चांगलीच झटपट केल्यावर, कसंबसं माथ्यावर पोहोचलो.
08_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

ज्यासाठी केला एवढा अट्टाहास, अशी प्रचीती देणारं साक्षात्कार दृश्य समोर... ट्रेकर्सचं आराध्य असलेली कळसूबाई – अलंग – मदन – कुलंग ची रांग कोवळ्या उन्हांत न्हात सामोरी होती. आजमितीस भर्राट वारा सोडला, तर गडावर काहीच नाही.

गडप्रदक्षिणा करून अर्थातंच मळलेल्या वाटेनं गडाच्या पदरात पोहोचलो. मगाशी चढताना इथंच वाट चुकली होती, त्याचं विश्लेषण होवून, या ठिकाणी वाट चुकणं साहजिकंच कसं आहे, असं justification शोधलं गेलं.
10_MoKaTri_DiscoverSahyadri.jpg

इगतपुरीच्या दुर्गत्रिकुटातला पहिला गड – मोरधनची तीन तासांत चढाई-उतराई केल्यामुळे, आम्ही मे महिन्यातल्या ट्रेकसाठी rhythm मध्ये आलो.

 

 मोरधन किल्ला 
मोरा किंवा मोरधन डोंगराच्या पठारावरून मोरधन गडाचा काढलेला फोटो.  गड उत्तरदक्षिणेला  लांब पसरलेला दिसतो.
मोरधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  
  

ह्या वर्षीच्या पावसाळ्यातील हा पाचवा ट्रेक होता. पण ह्या अगोदरचा ट्रेकपेक्षा ह्या ट्रेकला मिळालेला पावासाचा अनुभव आणि गड माथ्यावर लागणारा जोराचा वारा, ढगांचा खेळ, खूप सुंदर होता. गडावरील अवशेष पाहता, हा टेहळणीचा  किल्ला असल्याचे कळून येते.

प्रवासाचे वर्णन:
शुक्रवारी रात्री आमचा, रविवारी १२ ऑगस्टला मोरधन करायचा ठरल्यामुळे, आम्हाला एक्सप्रेस ट्रेनची तिकीट भेटली नाही. त्यामुळे आम्ही कसारा लोकलने जायच ठरवले. मी सकाळी ५. १२ ची कसारा पकडली, प्रणव आणि विनय डोबवलीला भेटले. ७. ४० ला आम्ही कसारा पोहचलो. तिथेच आम्ही नाश्ता करून. कसारा स्थानकातून शेअर गाडीने अर्ध्यातासात घोटीला पोहचलो.
कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे, त्यासाठी गाडीवाले प्रत्येकी ४० रुपये घेतात. पण तो अर्धातासाचा प्रवास अनुभवून, भुसावळ पॅसेंजरने सरळ घोटीला आलो असतो तर परवडलं असत. असे मला वाटत होते. घोटी स्थानकातून खैरगाव साठी एसटी नाही. त्यासाठी शेअर गाडीने किंवा खाजगी रिक्षा करून जायला लागते. किंवा एसटीने देवळे गावात उतरून खैरगाव साठी शेअर किंवा रिक्षाने जावे. घोटी ते खैरगाव अंतर अंदाजे ५ते ६ किमी असेल. त्यासाठी रिक्षावाल्यालाने आम्हाला ३०० रुपये घेऊन जरा लुबाडलच, हे प्रवास केल्यानंतर आम्हाला कळून आले. येतेवेळी आम्ही गावातीलच एकाचा गाडीने आलो त्याने १५० रुपये घेतले. पण जर शेअर गाडीने आलो असतो, तर अंदाजे प्रत्येकी २० ते ३० रुपये घेत असतील. असा माझा अंदाज आहे.

गडाच्या वाटेच वर्णन:
सव्वा दहा वाजता आम्ही खैरगावातील शाळेजवळून ट्रेकला सुरवात केली. शाळेजवळ वाटेत मध्येच झाडाखाली उघड्यावर गणपतीची थोडी प्राचीन अशी मूर्ती दिसते. तिथून पुढे, गावातून आम्ही वाट विचारत ५ मिनटात, गावाचा पाठीमागे बाहेर आलो.

गावातून  बाहेर गडाचा दिशेने आलो असता. मोरधन गडाची किंवा मोरा डोंगराची एक सोंड गावाचा दिशेने आलेली दिसते. ह्या डोंगराच्या वर आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर दिसतो. सोंडेवरील ह्या वाटेने आपण, न चुकता डोंगर चढायला लागतो. वर चढल्यावर वाट डावीकडे वळत डोंगराची घळ लागते, तिथे घेऊन जाते.  इथून आपण ५ ते १० मिनटात डाव्याबाजूचा पठारावर पोहचतो.

मोरा किंवा मोरधनच्या डोंगराचा पठार:
आम्ही तासाभरात पठारावर पोहचलो. पठारावरून आपल्याला मोरधन गडाचा मुख्य डोंगर सरळ उत्तर दक्षिणेला लांब पसरलेला दिसतो. तसेच पठारावरून पलीकडील दरणा जलाशय दिसतो. सुसाट सुटलेल्याला वारा आणि पावसाचा थोडावेळ आनंद घेऊन, आम्ही गडावर जाण्यासाठी पुढे चालू लागलो.

पठारावरून गडामाथ्यावर जाणारी वाटेचे वर्णन:
पठारावरून एक वाट सरळ पुढे जाताना दिसते. पण गडावर जाण्यासाठी वाटेने सरळ पुढे न जाता, आपल्या उजव्या बाजूला जेथे मोरधन गडाचा मुख्य शिखर सुरवात होतो. तिथूनच बरोबर खाली वाट आहे, हे लक्षात ठेवणे. कारण पठारावरून येणारी मोठी वाट सरळ पुढे जाते, त्यामुळे उजव्याबाजूची हि छोटी वाट दिसत नाही. त्यामुळे चुकून तुम्ही सरळ जाणाऱ्या वाटेने पुढे जाऊन चुकू शकता.

उजव्याबाजूची हि वाट, डावीकडे वर नागमोडी वळून सरळ न चुकता गडावर घेऊन जाते. ह्या वाटेने आपण  पाऊण ते एक तासात गडाच्या माथ्यावर पोहचतो.

गड माथ्यावरील वर्णन:
गडाच्या माथ्यावर पोहचल्यावर, आम्ही उजवीकडचा माथा जवळ आणि लहान असल्यामुळे. पहिलं त्यादिशेला गेलो. उजव्या माथ्याचा टोकाला, आपल्याला एक चौथऱ्याचे अवशेष आढळतात.  ह्या बाजूला माथ्यावर बाकी काही अवशेष नसल्यामुळे, आम्ही पाठीमागे फिरून डावीकडे गेलो.

डावीकडील माथा दक्षिणेला लांबवर पसरलेला आहे. ह्या बाजूला तुम्ही गडमाथ्यावर ज्या वाटेने येतात.  त्याचा डाव्या बाजूला, काही अंतरावर गडावरील एकमेव पाण्याचे टाके लागते. टाकीच्या पुढे दक्षिणेला गड माथा अजून लांब पसरलेला आहे. पण आम्ही वाचलेल्या माहितीनुसार टाकीच्या पुढील माथ्यावर काही अवशेष नाहीत. म्हणून आम्ही इथूनच मागे फिरून गड उतरायला सुरवात केली.

तसेही गडमाथ्यावर आलेले ढग आणि गवतामुळे अवशेष ओळखणे जरा अवघडच होते. त्यामुळे आमचा चुकून एकाद-दुसरा अवशेष राहून गेले असतील.

थोड्यावेळा साठी माथ्यावरून ढग बाजूला झाल्यामुळे गडा खालील परिसर दिसू लागला. गडाचा पश्चिम बाजूला आपल्या खैरगाव, घोटीचा परिसर दिसतो. पूर्वेला दरना जलाशयचा सुंदर परिसर सतत दिसतो. ढगांमुळे आम्हाला गडावरून आजूबाजूच्या परिसरातील किल्ले दिसले नाहीत. गडावर पाऊस आणि जोराचा वारा लागत होता. वारा एवढ्या जोरात वाहत होता, कि मध्येच आम्हाला त्याचा प्रवाहात ढकलत होता. त्यामुळे आम्ही जास्त करून गडाचा कडेला जाणे टाळले. 


थोडक्यात प्रवासाबद्दल 
  • मुंबई ते कसारा लोकल ट्रेन ने कसारा उतरावे 
  • कसारा ते घोटी अंतर २५ किमी आहे. त्यासाठी शेअर गाडी असतात. प्रत्येकी ३० रुपये घेतात. 
  • किंवा भुसावळ पॅसेंजर घोटी ला १० वाजता पोहचते. हा प्रवास शेअर गाडी पेक्षा उत्तम पडेल. 
  • घोटी ते खैरगाव अंतर ५ते ६ किमी आहे. 
  • घोटी वरून खैरगाव साठी शेअर गाडी भेटतात किंवा खाजगी रिक्षा करून जाणे. 
  • स्वतःची गाडीने  मुंबई ते नाशिक महामार्गावरून घोटीला, घोटी -शिर्डी रस्त्याने देवळे गावातून खैरगाव गाठावे. 
मोरधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा  

 https://kunalstrek.blogspot.com/2018/08/blog-post.html


पूरातन काळापासून नाशिक ही मोठी बाजारपेठ होती. डहाणू, तारापूर, सोपारा , कल्याण या बंदरात उतरणारा माल विविध मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत येत असे. यातील काही पूरातन घाटमार्ग, उदाहरणार्थ कसार्‍याचा "थळ" घाट, "त्र्यंबक" घाट हे आजही वापरात आहेत. तर काही घाटवाटा काळाच्या ओघात आता विस्मरणात गेलेल्या आहेत. त्याचपैकी एक असलेल्या "शिर"घाटावर नजर ठेवण्यासाठी मोरधन व कावनई किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी किनार्‍याजवळ , घाटमार्गावर व घाटावर किल्ले बांधून संरक्षणाची साखळी तयार केली जात असे. डहाणू, तारापूर या बंदरांवर किल्ले होते, त्यानंतर घाटमार्गावर भूपतगडचा किल्ला व घाटमाथ्यावर मोरधन व कावनईची संरक्षणासाठी योजना करण्यात आली होती.

Mordhan Fort, Mordhan Fort Trek, Mordhan Fort Trekking, Nashik

खैरगाव या छोट्याश्या वस्तीच्या उशाशी असलेल्या डोंगररांगेवर एकेकाळी मोरांचा वावर होता त्यामुळे हा डोंगर आजही मोरा डोंगर म्हणून ओळखला जातो. मोरा डोंगराच्या सर्वोच्च टोकावर मोरधन किल्ला आहे. या किल्ल्याचे स्थान व यावरील अवशेष पहाता मोरधन किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी झाला असावा.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

खैरगावातील तिठ्यावर उतरल्यावर गावात शिरणार्‍या रस्त्याने २ मिनिटात आपण शाळेजवळ पोहोचतो. येथे एका चौथर्‍यावर आभाळाखाली गणपतीची शेंदुर लावलेली मुर्ती ठेवलेली आहे. गजानना दर्शन घेऊन मोरा डोंगराच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. गावा मागे पसरलेल्या मोरा डोंगराच्या मागे एक कातळटोपी घातलेला डोंगर दिसतो तोच "मोरधन किल्ला" होय. किल्ल्यावर जाण्यासाठी समोरच्या डोंगराच्या कातळ कड्याच्या खाली पोहचावे, येथून कातळ कड्याला वळसा घालून पायवाट दोन डोंगरांच्या घळीतून वर पठारावर जाते. पावसाळ्यात या घळीतून ओढा वहात असतो. पठारावर आल्यावर उजव्या बाजूला मोरधन किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला डोंगर दिसतो. पायथ्याच्या खैरगावातून पठारावर पोहोचण्यासाठी साधारणपणे दिड तास लागतो. पठाराच्या दक्षिण टोकाला झर्‍याच्या काठी मंदिर व आश्रम आहे.

पठारावरून किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्या़चा डोंगर उजवीकडे ठेऊन डोंगरावर चढणारी वाट पकडावी. साधारणपणे ३० मिनिटात गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथा दक्षिणोत्तर पसरलेला असून त्याची रुंदी कमी आहे. गड माथ्यावर दक्षिणेला व उत्तरेला एक पाण्याच टाक व घराच जोत आहे. दक्षिणेकडील टाक्याच्या काठावर देवाची बैठक आहे. एका दंतकथे नुसार आज नाशिक जवळ असलेली पांडवलेणी देव या डोंगरावर एका रात्रीत खोदणार होते. पण टाक खोदून झाल्यावर अवेळी (रात्रीच) कोंबडा आरवला. त्यामुळे देवांना वाटले सकाळ झाली आणि ते मोरा डोंगर सोडून पुढे गेले. देवांनी टाक्याच्या काठावर जिथे विश्रांती घेतली , त्या जागी कातळाला विशिष्ट आकार आलेला आहे. त्याला स्थानिक लोक देवाची बैठक म्हणतात.

गडमाथ्यावर भन्नाट वारा असतो. गडमाथ्यावरून पूर्वेला कळसूबाईच डोंगर, अलंग, मदन, कुलंग हे किल्ले दिसतात. उत्तरेला कावनई किल्ला व त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. तसेच नांदगाव धरणाचा कॅचमेंट एरीया गडावरून दिसतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

१) रस्त्याने: मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबई पासून १२८ किमी अंतरावर घोटी गाव आहे. घोटी गावातून घोटी - सिन्नर रस्ता जातो. या रस्त्यावर घोटी पासून ४ किमी अंतरावर देवळे गाव आहे. देवळे गावातून उजव्या बाजूचा रस्ता २ किमी वरील किल्ल्याच्या पायथ्याच्या खैरगावात जातो.

२) रेल्वेने:
अ) मुंबईहून सकाळी ५.२९ वाजता ( ठाणे - ५.५९ , कल्याण - ६.२० ) निघणारी मुंबई - भुसावळ पॅसेंजर (५११५३ डाऊन /५११५४ अप) गाडी पकडावी, ही गाडी १०.०० वाजता घोटी स्थानकात पोहोचते. येथून बस स्टॅंडला येऊन रिक्षा किंवा जीपने खैरगावात जाता येते. मुंबईला परत येण्यासाठी भुसावळ - मुंबई पॅसेंजर दुपारी २.०० वाजता आहे.

ब) मुंबईहून रेल्वेने कसारा गाठावं. कसार्‍याहून जीप किंवा बसने घोटी गाठावं. घोटी बस स्टॅंडवरून रिक्षा किंवा जीपने खैरगावात जाता येते.

राहाण्याची सोय

गडावर रहाण्याची सोय नाही. खैरगावातील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

गडावर किंवा खैरगावात जेवणाची सोय नाही. घोटी येथे जेवणाची सोय आहे.

पाण्याची सोय

गडावर पिण्यासाठी पाणी नाही . पाणी सोबत बाळगावे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

खैरगावातून मोरधन किल्ल्यावर जाण्यासाठी २ तास लागतात.

 १. मोरधन किल्ला नाशिकचे दुर्गअभ्यासक श्री. गिरीश टकले यांनी शोधला. मुघलकालीन पत्रांत याचा मोरदंत म्हणून उल्लेख येतो. मोरधन माथ्यावर आल्याबरोबर उजवीकडे एक टाके आहे. ते पाहिले नाही कां? या किल्ल्याच्या सोंडेला नेढंदेखील आहे. 

 

गडावर मुक्काम करायला काही नाही त्यामुळे पोलीस पाटलाचे घर शोधून अवजड सॅक तिथेच ठेवल्या आणि गडाकडे सुटलो.
From

खालून पाहिल्यावर हा किल्ला एखाद्या पाणबुडीच्या आकाराचा वाटतो. पहिल्याप्रथम कळतच नाही वाट कुठे आहे. पण सुरुवातीचा घसारा पार करून गेल्यावर छोटी पायवाट दृष्टीस पडते.

From

From

या बेचक्यातून किल्ल्यावर वाट जाते

From

From

From

मोरधन दुसऱया बाजूने

From

त्या गावकऱयाने सांगितल्याप्रमाणे गड म्हणावे असे काहीही बांधकाम शिल्लक नाही. आणि वारा तर इतका सुसाट की थोड्याच वेळात कान दुखायला लागले. शेवटी कान रुमालाने बांधून गड पायाखाली घातला आणि आल्यापावली परतलो.
तत्पूर्वी सूर्यास्ताची मनोहारी दृश्ये कॅमेरात टिपण्याची संधी दवडली नाही. वाहवा आजचा दिवस फारच मस्त झाला. सूर्योदय कावनईवर आणि सूर्यास्त मोरधनवर.

From

From

किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त

From

सॅक ताब्यात घेताना तिथे जमलेले बाळ-गोपाळ पाहून त्यांचे फोटोसेशन करायचा मोह आवरला नाही.

आणि त्याचा भारी परिणाम झाला. आपल्या पोरांचे फोटोसेशन चाललेय म्हणल्यावर घरातून एकदम पोह्याच्या बश्या आणि गरमागरम चहा आला. पाठोपाठ आम्हाला देवळे फाट्याला जाण्यासाठी टेंपोचीही व्यवस्था करण्यात आली.
अर्थात जाण्यापूर्वी इथेही ताकेदला जाण्यासाठी प्रेमळ आग्रह झालाच. अतिरिक्त माहीती अशी कळाली ही यात्रेबरोबर तमाशाचा फडही असतो. बास, मग काय पाहीजे.
मग खरोखरच आमचे मन दोलायमान व्हायला सुरूवात झाली. माझे म्हणणे होते की आत्ता ताकेदला जाऊ, मस्त तमाशा पाहू आणि दुसरे दिवशी कळसूबाईला जाऊ. पण यात असा प्रॉब्लेम होता की कळसूबाईला जायला उशीर झाला तर उन्हाचे चढायला जाम त्रास झाला असता. आणि स्वप्नीलचा असा अंदाज होता की यात्रा म्हणजे मोठा इव्हेंट आहे तिथे फोटोग्राफीचा चांगला चान्स मिळेल. आम्ही देवळे फाट्याला पोहोचलो तरी आमचे एकमत होईना. फाट्यावर गेल्यावर आम्ही दिसेल त्या गाडीला हात दाखवायला सुरूवात केली. बाहेरगावचे पाहुणे म्हणल्यावर एक म्हातारबुवा पुढे आले आणि त्यांनी चौकशी केली. आम्ही ताकेदला किंवा बारीला (कळसूबाईच्या पायथ्याचे गाव) जायचे म्हणल्यावर त्यांनी मताची पिंक टाकलीच.
"म्या काय म्हनतो, तुमी रातच्याला ताकेदला जावा. उद्या महाशिवरात्र हाये, आनी तुम्हासनी गोष्ट सांगतो, ताकेदला रावण आणि जटायूचे युद्ध झालं व्हत. आनी मंग राम-लक्ष्मण.... " चालूच
त्यांना बरं बरं म्हणून थांबवले. पण ते उत्साहाने आमच्यासाठी गाड्यांना हात दाखवत राहीले. ताकेद..ताकेद म्हणत राहीलो पण एकही गाडी थांबायला तयार नाही. तेवढ्यात एक जीप थांबली. म्हातारबुवांनी मोठ्या सलगीने "काय मंग यात्रेला निघाला जनू" असे करत ड्रायव्हरशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. ती जीप निघाली होती भलत्याच गावाला.. त्यानी विचारले तुमाला कंच्या गावाला जायचं. म्हातारबुवा ताकेद असे सांगतायत तोच स्वप्निलला काय वाटले कुणास ठाऊक त्याने एकदम मागून बारी सांगितले. म्हातारबुवा एकदम तोंडघशी पडले. त्यांची बाजू सावरावी म्हणून मी म्हणालो
"नाही ताकेदलाच जायचय पण बारीला सोडलत तरी चालेल, तिकडून जाऊ आम्ही ताकेदला."
पण अमेयने आपले घोडे दामटलेच.
"अरे आपण बारीलाच जाऊया, ताकेदचा प्लॅन उद्या करूया,"
इतक्या गोंधळाने तो जीपवाला काही न बोलता निघूनच गेला. आणि म्हातारबुवा एकदमच कावले.
"तुमाला कुटं जायाच ते ठरवा आगुंदर, नक्की कुटं जानार हाय तुम्ही? उगाच खालीपिली डोसक्याला तरास"
आणि कहर म्हणजे तडातडा चालते झाले. इथे आमची हसून हसून पुरेवाट झाली. या गोंधळात रात्रीचे अकरा वाजले तरी एकही गाडी नाही, जीप नाही. कोणीही आम्हाला न्यायला तयारच नाही. ताकेदला जाण्याऱया अनेक गाड्या भेटल्या पण त्या आधीच इतक्या खचाखच भरलेल्या असायच्या, त्या फॅमिली-मेंबर असले तर कोणी गाडी थांबवण्याची तसदीपण घेत नव्हते. शेवटी नाईलाज म्हणून जवळच्याच एका हनुमान मंदिरात मुक्काम करून दुसऱया दिवशी सकाळी ताकेदला जाण्याचे ठरले. त्याप्रमाणे मंदिराच्या आवारात तंबू टाकला आणि च्याऊ म्याऊ पोटात ढकलून झोपलो.
दिवस तिसरा -
पहाटे पहाटे जाग आली ती पोरांच्या आवाजाने. डोळे उघडले तर तंबूच्या खिडकीतून चारपाच चेहरे आत डोकाऊन बघत होते. एकदम दचकून उठलो आणि कनात उघडली तर एकच गिल्ला झाला.
"आर मान्स उठली रं उठली, उघडालेत..."
आणि जादूचे खेळ पहाण्यासाठी बसतात तशी बालगोपाळ मंडळी, त्यांच्या परकर्‍या ताया, कडेला पोराला घटट् बसवून आलेल्या आया आणि काही बापय गडी. फुल्ल कोरम.... आम्ही तंबूमधून बाहेर कसे येतोय हे पहात बसलेली.

From

आपल्या एकूण एक हालचालींकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत हे कळल्यावर जो ऑकवर्डपणा येतो त्याला कशाची तुलना नाही. वातावरणात जरा बदल व्हावा म्हणून मग आम्ही ताकेदच्या गाडीची चौकशी केली. त्यावरून आम्हाला कळले की आता देवळे फाट्यावरून आम्हाला गाडी मिळणार नाही. सगळ्या गाड्या घोटीवरून भरून येणार. त्यामुळे तुम्ही घोटीलाच जाऊन गाडीत बसा. तेवढ्यात ते कालचे म्हातारबुवा आलेच.
"काय मंग ठरलं का कुटं जायाचं ते. का चाल्ले घरला?"
त्यांना काहीच उत्तर न देता आलीया भोगासी म्हणत आवराआवर केली. चहाची जबरदस्त तल्लफ आलेली पण तेवढ्यासाठी परत स्टो पेटवायचा कंटाळा केला. आजूबाजूला चहा मिळेल असे काही हॉटेल किंवा दुकानही दिसेना. एका घराच्या अंगणात काही पोरे महाशिवरात्रीची आंघोळ करत होती. मग कालचीच युक्ती केली. (फोटो काढा चहा मिळवा). कॅमेरा काढला आणि भराभर पोरांचे फोटो काढायला सुरूवात केली. एवढी प्रसिद्धी मिळतीये म्हणल्यावर गर्दी जमलीच.

मग आणखीही पोरांना आंघोळ घालायला आणले. कहर म्हणजे त्यातल्या एकाची झाली होती त्याला फोटोसाठी म्हणून परत धुवायला त्याची माय निघाली होती.
"अग आये झाली की माझी अंघुळ,"
"मेल्या आनी परत चिखलात गेलास," असे म्हणून पाठीत धपाटा बसला.
सत्य हे नेहमी कटू असते असा अनुभव नोंदवत त्या गरीब पोराने पुन्हा एकदा अंग विसळून घेतले.
दरम्यान, घरातून चहा आलाच. तो पिऊन घोटीच्या दिशेने निघालो. वाटेत नदीवर सर्व विधी उरकले आणि चटचटीत उन्हाचे घोटीकडे निघालो.

मी, अमेय आणि स्वप्नील

तिथे आठवडी बाजारात थोडी खरेदी केली आणि नाष्टा करण्यासाठी हॉटेल शोधत निघालो. थोड्या वेळाने लक्षात आले की गावकरी आमच्याकडे वळून वळून पाहतायत. आता आम्हाला काय शिंगे फुटली की काय असे म्हणत मी मागे या दोघांकडे पाहिले तेव्हा मला उलगडा झाला. झाले होते असे की केलेली खरेदी सॅकमध्ये भरण्याचा कंटाळा केला होता. त्यामुळे माझ्या हातात एक स्टेनलेसस्टीलचा पेला, त्यात लिंबे आणि मिरच्या (पोह्यांची तयारी) आणि एक टूथब्रश (येताना आणायचा विसरलो होतो) आणि खांद्यावरून वेटर घेतात तसा टॉवेल टाकलेला, माझ्या मागे अमेय - त्याने नदीवर कपडे धुतल्यानंतर आपली वस्त्रे सॅकवर बांधून वाळत घातले होते (अगदी अंतवस्त्रेही, आवरा) आणि हातात टोप (मोठे तपेले) तर स्वप्नीलने हाताची नखे वाढली म्हणून नेलकटर घेतला होता आणि तो चालत चालत नखे कापत होता आणि त्याच्या सॅकवर दोन मोठ्या कॅरीमॅटस गुंडाळी करून बांधण्यात आल्या होत्या. भरीस भर म्हणून आमच्या प्रचंड अवजड बॅगा. आता या दृश्याकडे गावकरी वळून पाहणार नाहीत तर काय.
असो, तर नाष्टा कम जेवण करून आम्ही ताकेदच्या दिशेने सुटलो.
जीप ताकेदला पोहोचली आणि समोरचे दृश्य पाहून धसकलोच. जिथे जिथे जागा मिळेल तिथे लोकांनी आपली वहाने पार्क केली होती आणि अक्षरश लाखोंच्या संख्येने भाविक लोक मंदिराच्या दिशेने चालले होते आणि चालणे सोडा पाऊल ठेवायलाही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती होती. आता करायचे तरी काय अशा विचारात असतानाचा मागून आलेल्या लोंढ्याने आम्हाला ढकलायला सुरूवात केली आणि पाहता पाहत आणि तिघे तीन दिशांना विभागले गेलो.
From

क्रमश
पुढचा भाग
http://www.maayboli.com/node/18212
कळसुबाईच्या दर्शनाला या रं या

हाच लेख मी माझे दुर्गभ्रमण या ग्रुपमध्ये दिला होता. पण काही जणांनी सांगितल्यानुसार जर कोणी त्या ग्रुपचे सदस्य नसेल तर त्यांना हा लेख वाचता येत नाही. म्हणून वेगळ्या नावाने (आणि अधिक फोटोंसह) हा लेख ललीतमध्ये टाकत आहे.
काही चुकले असेल तर आडमिनने मार्गदर्शन करावे...


 मोरधन

|| श्री अशापुरी देव्यै नमः ||

it starts with मोर / मो.. मोरधन

पुण्यात असलो की सिंहगडचा कंटाळा नाही येत ☺️ पण नाशिकला असल्यावर सारखं-सारखं पांडवलेणी नकोसं 😒 वाटतं.. म्हणून शोधाशोध 🧐 सुरू झाली आसपास असलेल्या suitable-for-half-day-hiking गडांची.. त्यातला एक मोरधन..

पण मग मोरधन starts ▶️ with मोर / मो, हे 🚀 rocket science तर नाही.. मग विशेष काय? तर 'half day trek साठी किती type करणार?' म्हणून extras साठी काहीतरी.. २ वर्षांगोदर (मार्च २०१९) आम्ही मोरगिरी केला होता, जिथे आम्हाला जंगलातून वाट शोधावी लागली होती.. guidance 📓 साठी वाचलेले blogs आणि download 📩 केलेले trail आपण नीट follow करायला चुकतो / चुकू शकतो, ह्याचा पाहिला अनुभव.. पण इथे calculated risk अशी होती की jungle was full of कार्वी, so everybody was determined, especially when the flagtop ⛳ was very clearly visible.. आणि तसंच डिसेंबर २०२० 🎅 मध्ये मोहनदरीला नेढ्या पासून वर top ला गेलो होतो जिथे फक्त rock patch होता / होते.. पण इथे सुद्धा risk calculatedच होती.. गेल्या महिन्यातच एका काकांचे top हून नेढ्यात उतरायचे अनुभव ऐकले होते, तर इतके trek केले असता (technically) "उतरण्यापेक्षा चढणे सोपे असते" हा स्वतः अनुभवून build केलेला confidence सोबतीला होताच 😊.. plus सोबत होती आमची मजा बघणारी गावातली काही मुले.. म्हणजे, कुठे अडकलो वगैरे असतो तर help 😣 हाकेच्या अंतरावर होती.. पण, but, पर, आजच्या मोर / मो मध्ये होता over confidence आणि होती uncalculated risk..

पुढे काही लिहिण्याधी I accept my mistake 😔.. वाट सापडत नसतांना आम्ही actually आणि happily माघारी यायला हवं होतं, especially considering आज सोबत होते family members 🏘️ (otherwise too, continuing was not a good choice).. पण ते म्हणतात ना "अंत भला तो सब भला".. so, let's start again 🔁.. 

किस्से नसलेले trek कसले?.. मोरधन

४ जुलै २०२१

सकाळी ६:१५ वाजता अमोलच्या घरून आम्ही चौघेजण निघालो.. अमोल माझा cousin आणि समृद्धी (गौरी), ओम माझे cousin भाची, cousin पुतण्या (अमोलची भाची आणि cousin पुतण्या).. Google Maps 🌍 वरचे reviews वाचून पिंपळगाव मोर ऐवजी खैरगाव हून trek करायचं ठरवलं.. हे ठरवण्यात आणि साथ दिली AllTrails app वर सापडलेल्या trail ने..

०७:१५ ला trek चालू केला तेव्हा doubt आला, forecast मध्ये ना पाऊस 🌧️, ना cloud cover ☁️, मग इतकं धुकं !? seasonal companion 🌂 ला आज 'घरी आराम कर' सांगून आलो होतो आणि म्हणुनच 'आज पाऊस नको' मनातल्या मनात म्हणत apps वर recording ⏺️ चालू केलं.. no offense, पण माझ्यामते raincoat 🧥 चा scope / उपयोग फक्त दुचाकी 🏍️ वरच असतो.. each one of you will disagree, but that's perfectly fine - we are democracy 🇮🇳..


सुरुवातीलाच एक हिरवा गालिचा दिसला, आणि दिसताक्षणी "मेरे देश की धरती" गाणं 🎶 आठवलं.. हळू-हळू वर चढत आम्ही कधीकाळी असलेल्या बुरुजाखाली पोहोचलो.. एक काका त्यांच्या 🐄 ३ गायींना वर चरायला घेऊन जात होते.. भैरवगड-रतनगड trek ला वाटेत भेटलेल्या साधारण १०० गायींपुढे किंवा आपल्याला कधी-कधी शहरात सुद्धा जो शेकडोंचा 🐑 कळप दिसतो, त्यापुढे हे जरा unusual वाटलं, म्हणून सहज विचारल्यावर कळलं की चौथीला चढता येत नसल्याने आणता येत नाही.. आकडा तरी relatively छोटाच होता.. गंमत आहे ना 😟, आपल्याकडे एकही नाही आणि दुसऱ्यांना कमी-जास्त म्हणतो !! आठवतंय काही / भरपूर काही?


दुर्मिळ शांतता 🕊️ सुरुवातीपासूनच होती आणि पुढे शेजारच्या खिंडीतून वर चढत, सपाटीला येऊन बेधुंद शुद्ध हवा, हिरवीगार गवती चादर 🍃 आणि स्वर्गीय ढगांना 🌥️ समांतर दारणा नदीचा view जे तिच्या सोबतीला धावून आले, त्याला काही मोजमाप नव्हतं 😍.. वर top ला अजूनही धुकं होतं म्हणून डावीकडे फडकणाऱ्या झंड्याकडे जाण्या अगोदर top ला जाऊन येऊ, असं ठरलं आणि mobile network 📶 असल्याचा फायदा घेत (घरी काही phone करून) आम्ही उजवीकडे दिसणाऱ्या वाटेला लागलो.. काही अंतर सरल्यावर लक्षात आलं, वर जी एक वाट दिसते आहे, आपण तिच्या दिशेने नाही तर साधारण traverse करत गडाच्या मागच्या बाजूला जात आहोत 🔙.. AllTrails वरील trail बघता लक्षात आलं की एक right turn ➡️ राहून गेला.. माघारी येऊन तो जेव्हा वाढलेल्या गवतामुळे नाही सापडला, तेव्हा परत त्याच रस्त्याने गडाच्या मागच्या बाजूने आहे का काही option, हा चुकीचा 🚫 विचार फक्त मनातच नाही तर अमलात सुद्धा आला..



पक्षी काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, पण आमच्याकडे मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि universal language पलीकडे समजण्याची प्रतिभा नाही म्हणटल्यावर काही पर्याय नव्हता 🤷..

शोध होती फक्त उजवीकडे दिसणाऱ्या वाटेची, ज्यात आम्हाला यश नाही मिळालं ☹️.. समोर थोडा gradual आणि manageable चढ बघत आम्ही वर चढायला सुरुवात केली.. काही अंतरावर खडक दिसत होता आणि तिथपर्यंत पोहोचलो म्हणजे 'top आलाच' असा समज होता.. पण Paulo Coelho ची एक म्हण 🧠 सतत सतावत होती, "The way up to the top of the mountain is always longer than you think. Don't fool yourself, the moment will arrive when what seemed so near is still very far.".. त्या rockpatch पर्यंत सगळे व्यवस्थित पोहचलो.. तिथून पुढे बहुतेक जमणार नाही, हा समज घेऊन ओम आणि त्याच्या सोबत अमोल परतीला लागले.. पण तोपर्यंत, गौरी सगळ्यांपुढे पहिला टप्पा चढून गेली होती आणि तिथून मात्र पुढे गेल्याशिवाय पर्याय नव्हता.. तिच्याबरोबर top ला पोहचेपर्यंत मला हडसरची खुंटीची वाट आठवत होती.. कार्वी again rescued us big time.. 🎉 they say, 'history repeats', but not this one, never.. 🙅‍♂️

गौरीच्या म्हणण्याप्रमाणे तीला तीच्या survival instinct वर अजूनच भरोसा वाढला होता (I copy) 😇.. निसर्गाचा आनंद घेत 🙋, एकांतात स्वतःशी स्वतःची अजून ओळख करून घेत, थोड्या वेळात आम्ही उतरायला चालू केलं.. परततांना trail शोधूनच उतरायचं, हा निर्धार ठाम होता.. trail च्या जवळ जात लक्षात आलं की आम्ही जिथून वर आलो आहोत तिथेच जात आहोत 🤔.. अजून पुढे जेव्हा साधी, सोपी वाट (technically easy) reveal / expose झाली, तेव्हा जीवात जीव आला 😌.. पठारावर पोहोचलो तेव्हा लक्षात आलं की त्या वाढलेल्या गवतामुळे हरवलेला right turn फक्त १० पावलांवर होता 😳.. मोरगिरी ला पण इतक्याच अंतराने u-turn घेतला होता..


next target होतं समोर दिसणारा भगवा 🚩, पण त्या आधी वेळ होती खाली आरामासाठी टेकलेल्या अमोल आणि ओम ला surprise देऊन निराश करायची.. इतक्या लवकर आम्ही खाली येऊ, हा विचार त्यांनीच काय तर आम्ही सुद्धा केला नव्हता.. 'आपण इतकी सोपी वाट चुकलो' म्हणत अमोल responded, 'पण अशी मजा आली असती का?' (I copy) 🌞.. तिथे थोडा आणि पुढे भगव्याखाली उर्वरित आराम करत आम्ही कडक ऊन टाळायला, लागलीच खाली उतरायचं ठरवलं..


खिंडीतून खाली उतरत नाही तर गौरी "मामा ! माझा phone 📱 !!".. आजचा trek काही केल्या ठरल्याप्रमाणे जात नव्हता.. १२:३० च्या कडक ऊन्हात मी आणि अमोल परत वरच्या दिशेने.. कुशंका एकच, 'वर झंड्याखाली राहिला असेल'.. ओम सतत call 📲 करत होता, ह्या आशेने की ringtone ऐकून तरी आम्हाला काही दिशा लाभेल, पण त्यासाठी madam नी loud वर पण ठेवायला हवा ना? 📳.. confidence बघा, "ringtone कुठली आहे?", हे सुद्धा ती समजावून सांगत होती.. सकाळपासून record झालेला trail follow करत आम्ही फक्त 'जास्त लांब / वर नको' म्हणत / प्रार्थना करत निघालो.. नशीब खूपच चांगलं होतं की १५-२० मिनिटातच ⌚ phone दिसला / सापडला 😎..



अशी असते गंमत 🤗.. पण (कमीत कमी) एखादा गमतीदार किस्सा घडल्याशिवाय trek "trek" कसा होणार?

originally follow करत असलेल्या (AllTrails वर uploaded) trail प्रमाणे आपणही मोरधन-बिंडा-चिलंबा range trek करू, हा विचार मनात घर नसेल करून गेला 📝 तर नवलच झालं असतं.. असो, there is always a next time..

And, regarding 'मोर / मो'.. someone has quoted very well "there is no such thing as coincidence. The only thing is hitsuzen."..
hitsuzen म्हणजे A naturally foreordained event. A state in which other outcomes are impossible.
foreordained म्हणजे predestined.

http://sskothawade.blogspot.com/2021/07/blog-post.html

मोरधन

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३३२७ फुट

श्रेणी : मध्यम

गडकिल्ले फिरताना काही डोंगरावर आपल्याला या डोंगराला किल्ला का म्हणावे असा प्रश्न पडतो. कारण त्या डोंगरावर किल्लेपणाची खुण दाखवणारे ना तटबुरुज ना कोणती वास्तु. असलेच तर एखादे बुजलेले टाके व एक दोन घराचे अवशेष. मग अशा ठिकाणी तंगडतोड करत जायचे तरी कशाला तर याला उत्तर एकच ते तिथे आहेत म्हणुन. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे घोटीजवळील खैरगावचा मोरधन किल्ला. नाशिक हे पुर्वीपासुनच बाजारपेठ म्हणून प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी कल्याण,सोपारा, डहाणु बंदरात आलेला माल विविध घाटवाटांनी या बाजारपेठेत येत असे. या घाटवाटापैकी आज विस्मृतीत गेलेला एक घाटमार्ग म्हणजे शिरघाट. मोरधन हा या वाटेवरील एक टेहळणीचा किल्ला. नाशिककडे येणाऱ्या या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटावर बांधलेल्या किल्ल्यांच्या रांगेत मोरधन व कावनई हे दोन किल्ले बांधले गेले. खैरगाव हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन मुंबई-नाशीक महामार्गावरील घोटी-शिर्डी रस्त्याने देवळे फाट्यावरून हे अंतर १३५ कि.मी.आहे. देवळे फाट्यावरून खैरगावकडे जाताना डाव्या बाजुला एक पाणबुडीच्या आकाराचा डोंगर नजरेस पडतो तोच हा मोरधन किल्ला. खैरगावात हा किल्ला मोराडोंगर म्हणून ओळखला जातो. मोरा डोंगराच्या पठारावर असलेला दुसरा डोंगर म्हणजे मोरधन किल्ला आहे. मोरा डोंगराचे पठार अस्ताव्यस्त पसरलेले असुन त्यावरील किल्ल्याचा डोंगर मात्र आकाराने लहान व निमुळता आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला हे दोन्ही डोंगर चढुन पठार तुडवत जावे लागते. किल्ल्यावर जाणारी वाट गावातील भैरवनाथ मंदिराकडून असुन या मंदिराच्या आवारात उघडयावर एक शेंदूर फासलेली गणेशमुर्ती व शेजारी भग्न शिवलिंग व नंदी दिसुन येतो. पठाराकडे जाताना गावापासुन काही अंतरावर डाव्या बाजुला झाडीत एका समाधीचे अवशेष (विरगळ) दिसुन येतात. गडाखालील पठारावर गावकरी शेळ्या-गुरे चरायला नेत असल्याने वाट मळलेली पण डोंगराच्या कातळकड्यापर्यंत चांगलीच घसाऱ्याची आहे. कातळकड्याला वळसा घालत हि वाट दोन डोंगरांच्या घळीतून वर पठारावर जाते. पठारावर प्रवेश करताना असलेल्या खिंडीत काही चौकीवजा अवशेष दिसुन येतात. पायथ्यापासुन पठारावर येण्यास साधारण दिड तास लागतो. पठारावर आल्यावर समोरच मोरधन किल्ल्याचा उत्तर दक्षिण पसरलेला निमुळता डोंगर दिसतो तर डाव्या बाजुला निमुळते झालेल्या पठारावर भगवा झेंडा फडकताना दिसतो. किल्ल्याखाली पठाराच्या दुसऱ्या टोकाला एका झाडावर भगवा फडकताना दिसतो. या ठिकाणी एक मंदिर व आश्रम असुन तेथे दोन लहान झरे आहेत. यातील एका झऱ्याचे पाणी पिण्यायोग्य असुन दुसऱ्या झऱ्यातील पाणी पठारावर आलेली गुरे पितात. किल्ल्यावर जाण्यासाठी पठारावरून एक वाट किल्ल्या़चा डोंगर उजवीकडे ठेऊन तिरकस वर चढत जाते. हि वाट ओळखण्याची खुण म्हणजे या वाटेच्या वरील बाजुस एक कपार आहे अन्यथा पठारावर मोठया प्रमाणात गुराखी असतात त्यांना वाट विचारावी. या वाटेच्या शेवटच्या टप्प्यात घसरून आलेले तटबंदीचे घडीव दगड मोठया प्रमाणात दिसुन येतात. पठारावरून गडमाथ्यावर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. समुद्रसपाटीपासून गडाची उंची ३५१० फुट असुन निमुळता माथा असलेला हा गड दक्षिणोत्तर साधारण ८ एकरवर पसरलेला आहे. येथुन गडाच्या दुसऱ्या टोकाकडे जाताना वाटेत अलीकडे बांधलेले काही सिमेंट चौथरे दिसुन येतात. येथे खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके आहे पण सध्या ते मातीने भरलेले आहे. वाटेत पुढे खडकात खोदलेला एक रांजण (बळद) असुन त्याच्या पुढील भागात काही घरांचे अवशेष दिसुन येतात. वाटेच्या पुढील भागात डाव्या बाजुला एका वाड्याचे अवशेष असुन उजव्या बाजुला एक साचपाण्याचा पण सध्या मातीने भरलेला तलाव दिसतो. गडमाथ्याच्या टोकाला पहाऱ्याच्या चौकीचे अवशेष दिसतात व येथे आपली गडफेरी पुर्ण होते. गड फिरताना भणाणणारा वारा सतत आपली सोबत करत असतो. गडाच्या माथ्यावरून पूर्वेला कळसूबाई डोंगर, अलंग, मदन, कुलंग हे किल्ले तर उत्तरेला कावनई व त्रिंगलवाडी किल्ला दिसतो. गडाखाली पठारावर केवळ एका ठिकाणी झऱ्याचे पाणी पिण्यासाठी असल्याने पाणी सोबत बाळगावे. खैरगावातून मोरधन किल्ल्यावर जाण्यासाठी २ ते २.५ तास लागतात. किल्ल्याचे स्थान व यावरील अवशेष पहाता मोरधन किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी झाला असावा.
© Suresh Nimbalkar

 

Mordhan Fort Trek

Having completed 5 treks around karjat in just over a month i decided to head towards Kasara for some change in location. Without much time to waste I zeroed on Mordhan fort trek as my next adventure. Mordhan fort trek has such a wonderful location surrounded by water bodies of Darna river dam , and many hills & forts on the other side. If you get clear weather you can easily spot Kavnai, Tringalwadi, Harihar, Anjaneri, Brahmagiri on the North – West side of the fort. On the East side are Aundha , PAtta ( Vishramgad), Bitangad fort , while towards the south is Kalsubai & A-M-K trio

I am on a roll in this monsoon 2019. Last five weekends i have been on five different treks. First was 400 ft Kataldhar waterfall trek, second was Kondana Caves Trek and on third weekend’s Saturday I was getting drenched in an unknown waterfall ( more about it on my instagram) and on Sunday i did Kothaligad trek / Peth Fort Trek. Having done all the three treks with a K – name i was looking out for my next trek to be a K – named trek however plans didnt materialise and I ended up doing Sondai fort instead. As a consolation it was also in Karjat. Anycase back to to the Mordhan fort trek blog

How to Reach Mordhan fort from Mumbai and Pune ?

There are four routes for Mordhan fort from all the possible directions of the fort. The most common one is from Khairgaon. Other routes being from Pimpalgaon on east , Ubhadewadi/ Dawale to North. Also there is a route from Khed base village which is near to the Kalsubai range.


We ascended from Pimpalgaon & descended to Ubhadewadi. The trail from Pimpalgaon has terrific views of Darna river. However the trail tends to be a bit obscure while passing through the waterfall like route through couloir. Ubhadewadi road is straightforward while crossing connnected hills , however there are few patches near the fort plateau that is a bit risky . Doable but risky especially during monsoon . Khairgaon route is straight forward and can easily done. I have no details of the Khed route.

How to Reach Base village for Mordhan Fort Trek

All the four base villages lie on the same route of Ghoti – Bhandardara ( Ghoti – Shirdi if you may till Pimpalgaon) . Ghoti is the base point for most of the Treks at Kasara / Igatpuri side.

Nearest Railway Station for Mordhan fort trek is Kasara from Mumbai side

Igatpuri & Ghoti are the closest ones with lesser frequency

Public Transport: From Kasara station one can get many shared taxi / state transport bus to Ghoti. From Ghoti Khairgaon & Ubhadewadi is at 5 kms , Pimpalgaon is at 8 kms & Khed village is at 16 kms .

From Ghoti many shared rickshaws ply on the route . For Khairgaon one can get down at Deole and walk another 1 km to reach khairgaon. Ubhadewadi & Pimpalgaon are on the road itself.

Also there are direct options to reach Ghoti by train. (Taken from other blogs) Mumbai-Bhusaval passenger train at 5.21 am from Mumbai (Thane- 5.51am, Kalyan – 6.20am ) reaches Ghoti at 10.00 am. Same train goes back at 2 pm from Ghoti towards Mumbai. Latest timing can be checked with IRCTC

Staying options: You can stay in schools and temples after taking permission ofcourse. By my personal experience no one will stop you

Private Transport: One can directly drive to Ghoti and then to respective base village using google maps.

What should I carry on this trek ?

I prefer Ghar ka khana, fruits, dry fruits, lemon juice & lots of water. I DONT recommend maida products like biscuits &breads and carbonated drinks. I do carry 1 ₹ chocolates for quick energy boost.

My normal attire includes full sleeved clothes , cap & proper trek shoes ( No flip-flops) Good goggles i.e anti-glares are must for summer treks. I also carry safety gadgets like fire starter, waterproof torch, whistle, first-aid just in case.

My Journey @ Mordhan Fort Trek

After travelling on my bike for 5 different treks in Karjat since last month to Kataldhar waterfall trek, Kondana Caves Trek, Kothaligad trek / Peth Fort Trek , an unknown waterfall & Sondai trek , i finally decided to do a Kasara trek. My bike finally got some much needed rest.

With the usual set of trek friends we reached Kasara with a plan to do Mordhan Trek from a less taken route from Pimpalgaon. The route from Khairgaon is well documented and so we decided to explore this route from Pimpalgaon for a bit of adventure & the tremendous views of Darne dam in the backdrop.

Some ask me, Niraj why do like to take the road less taken ? my answer to such questions is because the road is less taken 

We had booked the usual taxi from Kasara to drop at Pimpalgaon with Mr . Prakash. We always book his taxi when we plan around Kasara.

Having reached Pimpalgaon at midnight we were looking for places to stay the night and found a Bhairavnath temple to stay for the night . We had brought a whole of raw materail to cook Khichdi for dinner. But having reached at about midnight in windy & cold conditions we decided to have the ready made food we had carried and have Khichdi at the top of the fort. The 2 kgs of rice & daal remained in my backpack to see the next day .


Bhairavnath temple where we stayed the night

I could barely sleep that night as the howling wind made noises scary enough to keep your creative mind thinking. I always find it difficult to sleep at new places. We woke up at 4 am. There was a well behind the temple which helped us refill our bottles .

Bro Tip : There is no water available on fort. If you planning to do this trek on hotter days make sure to carry 2 litres of water per head .

The temple in my background and the route to the right
Temple in the background

We had carried with ourselves some drawing books & sketch pens. At about 6 am we reached the near by Waghechi wadi where about 8-10 huts were still waking up. We gathered the half asleep children to distribute these books. Long live the Sunday morning sleep.

We requested one of them to allow us to use there chulha to cook some ready mix upma. With this upma in out stomachs we were ready to take on the Mordhan Trek.

With the start of the climb from Waghechi wadi ( Pimpalgaon) the route is very well marked and the back ground of Darne dam makes up for a perfect Sunday morning trek.

The trail then gains height to finally reveal the rocky plateau of the fort . Actual fort is above this plateau was hidden in clouds throughout the morning.

The critical point of the trek is to identify the trail to reach the plateau which is a bit unmarked. Trail goes across a small hill and then circumnavigates the main plateau from where the waterfall type of route become visible.

The small trail cutting the dense shrubs
mordhan fort trek blog: The beautiful green trail for Mordhan trek from Pimplegaon

 How to Earn money to travel full time ?


We had few new trekkers who were a bit slow but the provided me with many photo opportunities. Win- Win situation. During monsoon this fort is always surrounded by clouds providing no view from the top. Today was no different as the peak was surrounded with clouds. However during the climb it was hot as hell.

The couloir is a bit obscure route , but when I looked back i was amazed by this green maze


just posing

Once we made our way to the first plateau we took a quick break fast and devoured anything that was possibly edible . Imagine eating cucumber with mayonnaise and beet with potato. All ingredients of sandwich were eaten separately . Hunger is the best sauce 

quick breakfast

Going ahead we reached the edge of the plateau and were enthralled by Darne dam backwaters once again.

mordhan fort trek blog: Beautiful view of Darane dam from Mordhan fort trek plateau

The route then crawls to reach a temple and moving a bit ahead it bifurcates to start gaining height towards the actual fort a-k-a plateau 2. This is the point where the trail coming from Khairgaon & Ubhadewadi side co-incide.


Climb from plateau 1 to 2
mordhan fort trek blog: Posing in front of mighty mordhan fort plateau

View from any point on the trail is just terrific . We took another half an hour to slowly crawl the top. Once we reached the top there were huge white flowers to greet us .

the last climb for Mordhan

A bit ahead and we were at the top . This fort is always surrounded by clouds but today was a bit different as we had clear skies …..for a while .

Clouds parted for a while
Enjoying the clouds at top

Within few minutes the clouds had captured the fort and we got busy to hide our mobiles . This cloudy atmosphere gave us another photo opportunity

As soon as we reached the top there are remains of an old structure in the form of a rectangular block of stones and can easily overlooked due to beautiful view. None the less these rectangular demarcation was the only sign of a fort along with another water tank a bit ahead to the south. I didn’t go to see the cistern / tank as we were attacked by clouds.

As we put on our rain coats the clouds disappeared within minutes and we were being roasted by an extremely hot sun ( Even hotter than summer. i suffered some skin burns as i was not at all prepared for such a scorching time. Climate change is real)

We moved North enjoying the beautiful view which was slowly appearing in front of us as the clouds kept floating afar.

Finally the clouds cleared

There were few videos which i had seen the presence of a long cave. We were searching for this cave and finally found it here

The route to this small cave is a bit risky especially in monsoon. We carefully made our way to it. Sensibly only 3 of us from a group of 10 actually went there. Cave used to be a long one but a recent rock fall inside the cave has resulted it being a short one.

After the caves we did take few more pics around the top with the crystal clear weather. During this commotion is lost one leg of my gorailla pod / tripod. If some one finds it you know whom to return it.

I shot few more videos as finishing touches to my vlog which will take some time to be prepared as i have 7 pending videos to be made. Office-goers time constraints.

Descend

As we started to descend we enjoyed this beautiful view of the extended plateau 1. Enjoying these views to go down to plateau 1 and had options to either take the descend trail of Khairgaon or Ubahdewadi. Since Ubhadewadi was less explored and also provided a beautiful view of the fort we chose it.

This extended plateau looked liked Garbett point and had lots of big flowers & bigger butterflies. This plateau also has a nedhe / needle hole but we could not find it. However having seen so many beautiful things we could let one pass. One look behind and i could now see the entite Mordhan fort in all its glory.

Most common route for mordhan is from Khairgaon side, after crossing the ganesh temple in Khairgaon the route is a straightforward one and would look something like this .


View from Khairgaon

Though this was supposed to be a monsoon trek by this time the sun had totally roasted us.At one point i came across a rock which had a cool side and cooler shadow i couldn’t resisting a break here. The view was Jabardast.

Tired and enjoying the view

While sitting we came across a shepherd . This guy comes here to graze his cattle in morning and leaves by evening. He has been doing it for decades. This is what defines a great life for me . Just to enjoy the life as it comes.

Jobs are a modern – day invention . Greed is its partner.

TheFreeBird

Such is a life of happiness i envy. I had carried one 2 kilo rice & half kilo daal for khichdi. It never got cooked . So what was supposed to be devoured on fort was given to the people of the fort. Sheperd was happy. I was happy that he was happy.


With all this happiness, we rushed through the remaining descend to reach the base village of Ubahdewadi. There are many dhabas besides this road and we happily splurged 1500 amongst us devouring the hot rotis and hot shev bhaji & the likes.

I shot few filllers for the YouTube Video. Have a look at it below & subscribe to my channel for similar adventures

We called up the taxi . Reached Kasara. And I reached home 5 hours later.

Weekend well spent.

Adios !


how to travel full time ?


For those asking me how to get money & time to travel full time - Start trading & investing to get FINANCIAL FREEDOM within a year

Zerodha is the largest Indian stock broker

 How to start trading ?


Hope you enjoyed reading about Mordhan fort. If you have been trekking in Sahyadris for a long time you might consider graduating from trekking to mountaineering. Here are few other treks you may like:

Monsoon Waterfall Special

WEEKENDS near Mumbai & Pune ?

Matheran Trek Routes ?

WEEKENDS near Kasara & Nashik ?

Konkan Sea Forts ?

Risky ( Experience Required)

Offbeat

Out of  Maharashtra

https://www.thefreebird.net/blog/mordhan-fort-trek

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...