![]() |
| Crossing railway line at Chouk Station |
![]() |
| Walking on the other side of railway line with Irshalgad looking very prominent background |
![]() |
| Deciding our route of the trek |
![]() |
| initial gentle climb |
![]() |
| Climb was getting little steep and heat was torturing us to no end |
![]() |
| Chachu Break !!! |
![]() |
| View of Irshaalgad from Machi |
![]() |
| To reach the Top one has to traverse from left |
![]() |
| Karvanda Fruits which almost took us offtrack |
" Sab log karvande dhoondne aur khane me itne busy ho gaye ki raste ka kise ko dyan hi nahi ... so for few minutes we were struggling to find our way Rajesh,Pawan,and myself went ahead to check the route it was very thorny and the way was not clearly marked . We had to spend considerable time to find the way after spending 10-15 mins of climb we realised we are on a wrong trail. I can still vividly remember what a sight it was with Pramod perched at the top of one stone patch and Pawan perched on another stone patch and both thinking ki ab to is ke peech top per jane ko rashta hai...and what I was seeing standing at a distance was that there were further climb ahead. anyhow Rajesh managed to bring them down and we all descended and came to a clearing.We knew that a right turn has to be taken from the clearing to reach the pinnacle but bloody yeh right turn lena kahan se hai yeh samaj me hi nahi aa raha tha...
![]() |
| Micro break |
![]() |
| Even after losing the way everybody is busy with the photo session !! |
![]() |
| Guys fill up your water bottles here..last spot to fill up |
![]() |
| Lovely View Morbe Back Water |
![]() |
| All set for the Multi cuisine lunch |
![]() |
| Free climb of the Pinnacle for me |
Thankfully I reached the top safely. Later we helped all the members to climb up with the help of rope.
![]() |
| Add caption |
![]() |
| Rescue mission to bring Pawan down |
![]() |
| Abbe isko koi neeche utaro!! |
![]() |
| Ab uttar ja pyare!! |
एक्सप्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईला जाताना अनेक गडकिल्ले दिसत राहतात. पहिला टोलनाका पार केला कि डावीकडे धीर गंभीर लोहगड विसापूर उभे असतात तर जरा दूरवर तुंग मान उंचावून बघत असतो.उजवीकडे राजमाचीच्या तुंगारली धरणाजवळचे टॉवर दिसतात. खण्डाळ्याला नागफणी हात हलवून दाखवतो. घाट उतरून खोपोलीला उतरल्यावर उजवीकडे भीमाशंकर आणि पदरगड सोबत करू लागतात तर दुरवर डावीकडे कर्नाळ्याचा अंगठा थम्ब्स अप करून दाखवत असतो.जरा पुढे पनवेलजवळ आले की प्रबळ आणि इर्शाळ स्मित करून स्वागताला सज्ज असतात.कळंबोलीहून पुढे निघाले कि दूरवर हाजी मलंग तीन बोटे आणि करंगळी उंचावून आशीर्वाद देत असतो.
यापैकी बरेचसे किल्ले आतापर्यंत बघून झाले असले तरी प्रबळ आणि इर्शाळ मला नेहमीच हुलकावणी देत आले आहेत. त्यापैकी इर्शाळचा बेत अचानक ठरला आणि बघता बघता ८ -१० जण तयारही झाले.
वन डे ट्रेक असल्याने फार तयारी किंवा प्लॅनिंग न करता, पुणेकरांनी सरळ ट्रेनने कर्जतला जायचे आणि मुंबईकरांनी त्यांना तिथेच भेटून पुढचा प्रवास टमटम ने करायचं असा सोपा बेत ठरला.
मात्र ऐनवेळेला मरेने दगा दिला आणि डेक्कन क्वीन सोडून सर्व गाड्या रद्द केल्या. त्यामुळे आयत्या वेळी बेत बदलावा लागला आणि पुणेकर 2 गाड्यांमधून चौक फाट्याला येतील आणि मुंबईकर त्यांना तिथेच भेटतील असे ठरले.
यथासांग सर्वजण चौक फाट्याला भेटले आणि प्रथेप्रमाणे मिसळपाव चहा वगैरे होऊन मोरबे धरणाच्या
मार्गाला लागले (चौक फाट्यापासून 1 कि.मी. पुढे उजवीकडे छोटा रस्ता चौक रेल्वेस्टेशनला जातो. चौक गाव डावीकडे आहे तिकडे न जाणे ).
एकीकडे खेडेगावचे मोकळे वातावरण दिसू लागले. धरणाच्या भिंतीच्या कडेने गाड्या चालल्या होत्या.
आदिवासी पाडे दिसू लागले. एक दोन ठिकाणी थांबून रस्ता विचारला आणि एका ठिकाणी रस्ता संपला तिकडे गाड्या लावून चढाईला सुरुवात केली. साधारण १०चा सुमार होता पण ऊन तापत चालले होते. त्यामुळे पटापट पाय उचलू लागलो.
उजवीकडे मोरबे धरणाचा विशाल जलाशय सोबत करीत होता आणि त्यातील पाणी चमचमत होते.
दूरवर कर्जत पनवेल रेल्वे मार्ग दिसत होता आणि आगगाड्यांचे हॉर्न ऐकू येत होते.क्वचित पक्ष्यांचे सुस्वर ऐकू येत होते.डावीकडे एक दोन छोटी धरणे तलाव दिसत होते पण त्याकाठी बंगले असल्याने ते खाजगी तलाव आहेत कि काय असे वाटत होते. याना सी.आर.झेड वगैरे कसे लागू होत नाहीत कोण जाणे?
असो. वाट चढणीची असल्याने आणि डोक्यावर सूर्य तळपत असल्याने चांगलीच दमछाक होत होती आणि सारखे थांबून पाणी प्यावे लागत होते. तशातच एक म्हातारबुवा उतरताना दिसले. आम्ही झाडाच्या सावलीत बसलो होतो. म्हातारबुवा लंगडत आमच्याजवळ आले आणि आम्हाला विचारले " किल्ल्यावर चालला का?रस्ता माहित आहे का तुम्हाला ?" माझे शहरी मन मला सांगू लागले कि आता हा वाट दाखवतो म्हणणार आणि पैसे मागणार. म्हणून मी त्याला म्हटले कि आमचे लोक पुढे गेलेत त्यांना वाट माहितेय. तरी तो म्हणाला कि डाव्या बाजूनेच जात राहा ..म्हणजे वाट चुकणार नाही. आणि वरती पाणी भरपूर आहे. काळजी करू नका.पुढे त्याने पायाला बांधलेली चिंधी दाखवली आणि म्हणाला "कोयता लागला पायाला.खूप रक्त गेले. आता चौक ला जाऊन इंजेक्शन आणि पट्टी करून येतो. पुन्हा माझे शहरी मन सांगू लागले कि आता हा उपचारासाठी पैसे मागणार. पण त्याने तसे काहीच केले नाही. त्याची मुलगी का सून पाठून येत होती . ती आली आणि हा निघाला.
आता मात्र मलाच माझ्या विचारांची लाज वाटू लागली.शहरात येणाऱ्या एक एक अनुभवांमुळे आपली विचार करायची पद्धत कशी बिघडून गेलेय आजकाल.असोच.
मध्ये एक आदिवासी पाडा लागला. ते म्हातारबुवा तिथूनच आले होते. इकडे नाचणी आणि तांदुळाची शेती खूप दिसली. नाचणी विकतही घेता आली.
पाडा सोडून पुढे निघालो.आता आम्ही इर्शाळ उजव्या हाताला ठेवून चाललो होतो.इथून वर बघितले कि झोपलेल्या बुद्धाची पोझ दिसते असे म्हणतात.
ऊन तापत चालले होते. पण मधेच झाडी आली कि विसावा मिळत होता.पावसाळ्यातील गवतात अनेक किडे होते आणि अधे मध्ये चावून त्रासही देत होते.
एकीकडे आमचे फोटो ग्राफीचे प्रयोगही चालू होते. कुठे मधमाशीचा फोटो कधी, कुठे फुलाचा तर कुठे फुलपाखराचा.
नाहीतर पावलागणीक जवळ येत जाणारे इर्शालची शिखरे टीप असे चालेले होते.ऍपर्चर,वाईड अँगल, 18 ठेवायचे 55, 5.6 कि 11, पर्स्पेक्टिव ,आय. एस.ओ असे काय नी काय विषय बोलत बोलत आम्ही इर्शाळ च्या शिखराला येऊन भिडलो.
हायवेवरून दिसणाऱ्या दोन शिखरांपैकी हे उजवे शिखर. पण शिखरावर सरळ चढाई करता येत नाही. त्यासाठी डाव्या बाजूने झाडीत घुसावे लागते. दुसरी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथे येण्याआधी एके ठिकाणी वाट चुकून खालच्या दिशेने जाण्याचा संभव आहे. तेव्हा सतत वरती जाणारीच वाट घ्यावी.
(आम्हीपण चुकलो होतो पण वाटेतील एका झोपडीतील गोड आदिवासी मुलीने (बकुळा) आम्हाला योग्य वाटेला आणून सोडले) अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथवर मोरबे धरणाचे पाणी आपल्याला उजवीकडे दिसत राहते.ते दिसेनासे झाले तर समजावे कि वाट चुकली.
तर आता आम्ही सुळक्याच्या डावीकडून झाडीत घुसलो आणि वर जायला सुरुवात केली.शेवटची १०० मीटर चढाई राहिली असेल आणि एक पाण्याचे मधुर टाके लागले . अहाहा ..सकाळपासून ज्याची वाट पाहत होतो ते शेवटी मिळाले.
सगळ्यांनी पोटभर पाणी पिऊन घेतले आणि हात पाय सुद्धा धुतले.सगळे एकदम फ्रेश झाले.
आता एक कठीण टप्पा आहे पण कोणी भल्या ग्रुप ने एक लाकडी शिडी इथे भक्कमपणे अडकवली असल्याने सर्वजण तो टप्पा लीलया पार करून गेले आणि लवकरच वर नेढ्यात पोचले.
हे नेढे इर्शालच्या दोन्ही शिखरांच्या मध्यभागी आहे. नेढ्यात ३-४ लोक बसू शकतात आणि आसपासही थोडी मोकळी जागा आहे. सावलीही होती
दुपारचा १ वाजला होता त्यामुळे सर्वांनी शिदोर्या सोडल्या आणि सहभोजन केले.पुन्हा फोटोग्राफीचे काही प्रयोग झाले.
त्यानंतर नेढ्यावर चढून मागच्या बाजूला लावलेल्या झेंड्याबरोबर फोटो वगैरे झाले.
इर्शालची दोन्ही शिखरे अजून शंभरेक मीटर वर होती.आणि आमच्याकडे रोप होता पण आम्ही काही कसलेले गिर्यारोहक नाही.शिवाय उन्हाने खडक पार तापला होता. त्यामुळे दर्शनमात्रें समाधान मानले आणि उतरायला लागलो.
ट्रेक मस्त झाला याचे समाधान मनात होते. पण काही जण त्यावर संतुष्ट नव्हते. पनवेलच्या एका ग्रुपने काही वर्षांपुर्वी इर्शालच्या पोटात एक विवर शोधून काढले होते ते त्यांना बघायचे होते.त्यामुळे शोधाशोध सुरु झाली. पाण्याच्या टाक्या पर्यन्त खाली उतरलो आणि जरा उजवीकडे गेलो.थोड्या शोधानंतर वरच्या दिशेला एका लैला मजनूचे नाव लिहिलेले दिसले आणि त्यावरून तिकडे जायला वाट असावी असे कळले. मग काही उत्साही लोकांनी वाट शोधली आणि ५० फूट सोप्या चढाई नंतर ते विवर मिळाले.
हे म्हणजे अक्षरश: "चेरी ऑन द केक" होते. ईर्शाळाच्या डाव्या शिखराच्या पोटात हे आडवे विवर जवळ जवळ सत्तरेक फूट आतवर गेले आहे. ते कोणी आणि का खोदले असावे माहित नाही पण ते वाऱ्या पावसाने तयार झालेले नाही एव्हढे नक्की. आतमध्ये बघण्यासारखे काही नाही पण विझलेल्या शेकोटीवरून कोणीतरी ही जागा मुक्कामाला वापरल्याचे समजले.
काळजीपूर्वक खाली उतरलो. 3 वाजत आले होते.त्यामुळे आता झपाझप पावले उचलली आणि खाली उतरू लागलो. तासाभरात गाड्या लावलेल्या ठिकाणी पोचलो आणि पुढचा ट्रेक कोणता करावा याचा खल करीत परतीच्या प्रवासाला लागलो.
टीप.. सर्व छायाचित्र माझा मित्र श्री. प्रवीण पाटील याच्या सौजन्याने
रायगड, खालापूरः इर्शाळवाडी-इर्शाळगड कुठे आहे? जाणून घ्या, दरड कोसळलेला परिसर नेमका कसा

मुंबई-पुणे प्रवासात जुन्या महामार्गावरून गेला असाल, किंवा कर्जत-पनवेल रेल्वे लाईननं प्रवास केला असेल, तर इर्शाळगड तुमच्या नजरेतून निसटला नसेल.
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातल्या चौक गावाच्या उत्तरेकडचा हा छोटा किल्ला त्याच्या सुळक्याच्या विशिष्ट आकारामुळे लगेच लक्ष वेधून घेतो. याच सुळक्याच्या भागाखाली, साधारण पूर्वेला डोंगरपठारावर इर्शाळवाडी ही आदिवासी वस्ती आहे.

ज्या डोंगरावर हे गाव वसलं आहे, त्याच्या ईशान्येला माथेरानचा डोंगर आहे आणि पायथ्याशी मोरबे धरणाचा नवी मुंबईला पाणी पुरवणारा जलाशय आहे.
फोटो स्रोत, Sukhad Rane
इर्शाळगड आणि उजव्या कोपऱ्यात दिसणारी इर्शाळवाडीकडे जाणारी वाट.
दुर्ग अभ्यासक आणि रायगड जिल्ह्यातील 59 किल्य्यांची माहती देणाऱ्या इये ‘देशीचे दुर्ग’ या पुस्तकाचे लेखक सुखद राणे यांना हा परिसर परिचयाचा आहे.
ते सांगतात की, इर्शाळगडाच्या पश्चिमेस पनवेल, वायव्येस प्रबळगड व मलंगगड, उत्तरेस चंदेरी व पेब, नैऋत्येला कर्नाळा किल्ला, दक्षिणेला माणिकगड व सांकशी हे किल्ले आहेत तर पूर्वेस खंडाळा घाट व नागफणी आहे.
इर्शाळगडाचा इतिहास
फोटो स्रोत, Sukhad Rane
मोकळे मैदान आणि पाठीमागील गडाचा डोंगर यामध्ये दिसणाऱ्या झाडीत इर्शाळवाडीची वस्ती आहे. गडाच्या मधल्या टप्प्यातील डोंगर सुटून वाडीवर कोसळला
इर्शाळगडाचा इतिहासात फार कुठे उल्लेख येत नाही. पण आसपासचे गडकिल्ले आणि या परिसरातून बोरघाटाकडे म्हणजे आजच्या खंडाळा घाटाकडे जाणारी वाट पाहता, टेहळणीसाठी आणि मुख्यतः संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी या गडाचा वापर होत असावा, असं या परिसरातले इतिहास अभ्यासक सांगतात.
शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा मुलुख घेतला तेव्हा हा गड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा, असं स्थानिक संशोधक सांगतात.

इर्शाळवाडीत दरड कोसळली आणि संपूर्ण गाव गाडलं गेलं...
या गडाचं नाव फारसं कुठे इतिहासात घेतलं जात नसलं, तरी जवळच्या चौक गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचे सरनौबत आणि निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म याच चौक गावात झाला होता.
सुखद राणे सांगतात, “सतराव्या-अठराव्या शतकात चौक ही या परिसरातली मध्यवर्ती बाजारपेठ होती. बाजारपेठेचे संरक्षण आणि टेहळणीसाठी इर्शाळगड महत्त्वाचा होता. चोर, लुटारू, परकीय सत्ता, दरोडेखोर यांचे नेहमीच या बाजारपेठेवर लक्ष असायचे.
“अशाच एका व्यंकोजी वाघ नावाच्या लुटारूला नेताजी पालकर यांनी चौक पासून पाच किलोमीटरवर असलेल्या वडगाव इथे गाठले होते आणि चकमकीत ठार केले होते.”
सरनौबत नेताजी पालकरांचं गाव
चौकमध्ये आज नेताजी पालकरांचं स्मृतीस्थान म्हणून चौथरा उभारला आहे आणि दरवर्षी दोन फेब्रुवारीला उंबरखिंडीतल्या लढाईची आठवण म्हणजून चौक ते उंबरखिंड अशी मशाल यात्रा जाते.
शाहिस्तेखानाचे सरदार कार्तलबखान आणि रायबाघन यांचा शिवाजी महाराजांनी या उंबरखिंडीत पराभव केला होता, त्या लढाईत नेताजी पालकरांचाही मोठा वाटा होता.
इंग्रजांच्या काळात हळू हळू दऱ्या-डोंगरांचं सामरिक महत्त्व कमी होत गेलं. सुखद राणे सांगतात की माथेरानला पोहोचलेल्या युरोपियनांनी इर्शाळगडाचा आकार पाहून त्याला सॅडल हिल असे नाव ठेवले.
“स्थानिक लोक या गडाला जिन खोड म्हणत. दोन्हीचा अर्थ एकच होतो – खोगीर.”
फोटो स्रोत, Soniya Garware
खोगिरासारखा दिसणारा इर्शाळगडाचा माथा.
इर्शाळगड ट्रेक
- इर्शाळगड हा समुद्रसपाटीपासून साधारण 3700 फूट (1127 मीटर) उंचीवर आहे.
- राष्ट्रीय महामार्ग 48 (जुना NH4) पासून फार दूर नाही. या हायवेवरून गडाच्या पायथ्याशी असलेल्या नाणिवली गावापर्यंत रस्ता जातो.
- नाणिवलीपासून पुढे चालत जावे लागते. साधारण 2-3 किलोमीटर पायवाटेनं इथे चढत जावं लागतं. हा रस्ता तसा थोडासा अवघड आहे.
- तासभर चढाई केल्यावर माचीवर डोंगरपठारासारख्या भागात इर्शाळवाडी आहे. तिथून साधारणं शंभर मीटर उंच असा इर्शाळगड दिसतो.
फोटो स्रोत, Soniya Garware
प्रस्तराकडे जाणारी वाट
सुखद राणे सांगतात, “उत्तरेकडे एक आणि दक्षिणेकडे एक असे दोन कातळ प्रस्तर गड माथ्यावर असून त्यांच्या मधोमध खिंड आहे. इर्शाळवाडी ते खिंड साधारण दीड तासांची चढाई आहे.”
“खिंडी पायथ्याला असणाऱ्या कातळ टप्प्यावर इर्शाळ देवीचे स्थान आहे. खिंडीत वर चढण्यासाठी साधारण वीस मीटरची चढाई असनू ही चढाई घसाऱ्याची आहे.
“खिंडीत पाण्याचे टाके आहे, तसेच खिंडीच्या खाली नेढे अर्थात कातळात आरपार खोदलेली गुहा आहे. या नेढ्यात बसून पूर्व आणि पश्चिम असा दोन्ही बाजूंचा परिसर न्याहाळता येतो.”
उत्तरेकडचा प्रस्तर वीस-बावीस मीटर उंच असून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि गिर्यारोहणाचे, प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरूनच तो चढावा लागतो, अशी माहितीही सुखद राणे देतात.
फोटो स्रोत, Sukhad Rane
वाडीच्या वर असणाऱ्या गडाचा सुळका, पाठीमागे डाव्या बाजूच्या डोंगरावर प्रबळगड तर उजव्या बाजूच्या डोंगरावर माथेरान आहे. उजव्या बाजूच्या डोंगराचा भाग सुटून खाली वाडीवर कोसळला.
प्रामुख्यानं नवी मुंबई आणि कर्जत-खालापूर परिसरातले अनेक ट्रेकर्स प्रस्तरारोहणासाठी या गडाला भेट देतात.
विशेषतः वीकएण्डला गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकही येतात.
दुर्गम परिसर आणि बचावातल्या अडचणी
फोटो स्रोत, Soniya Garware
इर्शाळवाडीतली घरं
इर्शाळवाडी हा या ट्रेकमधला महत्त्वाचा आणि विश्रांतीचा टप्पा मानली जाते. गडावर चढाई करणाऱ्यांची जेवणाची सोयही या वाडीत होत असे.
इथे साधारण चाळीस घरं होती आणि 228 जण राहात होतो. त्याच परिसरात 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली आहे.
https://www.bbc.com/marathi/articles/cd1e5lvjrk1o
त्यामुळेच चढाईसाठी तुलनेनं मध्यम स्वरुपाचा मानला जात असला, तरी पावसामुळे इथे पोहोचणं आधीच कठीण जातं.
बचावकार्यातही हा मोठा अडसर ठरतो आहे, असं घटनास्थळी उपस्थित गिर्यारोहक सांगतात.
इर्शाळगड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ६०० मीटर आहे.
महाराष्ट्राच्या दुर्गश्रुंखलेतील एक महत्वाचा किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड.
गडाच्या पायथ्याशी इर्शाळवाडी हे गाव असून तेथून गडाचा चढ सुरु होतो. गडाकडे येण्यापूर्वी गडाच्या दक्षिणेकडील नढाळ येथे यावे लागते व तेथून प्रथम इर्शाळवाडी गाठून मग गडावर जाता येते.
हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे ६०० मीटर आहे.
गड चढत असताना पूर्वेकडील भव्य असे मोरबे धारण आणि आसमंतातील सह्याद्रीच्या शाखा पाहून डोळ्याचे पारणे फिटते.
या किल्ल्यास विशाळगड असे दुसरे नाव सुद्धा आहे आणि हा किल्ला ज्या डोंगरावर उभारण्यात आला आहे तो डोंगर विशाळ अथवा इर्शाळ या नावाने प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक या डोंगरास जिनखोड या नावाने ओळखतात.
इर्शाळगड हा किल्ला माथेरानच्या दक्षिणेस आहे व पूर्वी या ठिकाणी राहणारे युरोपियन लोक किल्ल्यास सॅडल हिल या नावाने ओळखत. गडास ही नावे मिळण्याचे कारण म्हणजे किल्ल्याच्या दोन बाजूस दोन सुळके असून लांबून पाहता हा किल्ला एखाद्या अश्वासारखा दिसतो.
किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी खडक फोडून वाट तयार करण्यात आली आहे. किल्ल्याच्या माथ्याचा चढ थोडा अवघड असून कातळारोहण करून वर जावे लागते.
कड्यावर पिण्याच्या पाण्याची टाकी कोरलेली दिसून येतात. कडा चढताना अवघड ठिकाणी शिडी तसेच दोरखंडाचा आधार घेऊन वर जावे लागते.
वाटेत एका गुहेत गडाची देवता इर्शाळ देवीचे मंदिर दिसून येते व मंदिरात देवीची मूर्ती आणि बाजूस आणखी दोन लहान मूर्ती दिसून येतात.
या किल्ल्याचे वैशिट्य म्हणजे या किल्ल्यास इतर किल्ल्यांसारखी तटबंदी नाही मात्र पाण्याची एकूण सहा कोरीव टाकी आणि चार निवासी गुहा या ठिकाणी आहेत त्यामुळे या किल्ल्याचा वापर टेहळणी साठी केला जात असावा.
किल्ल्यावर एका ठिकाणी हे नैसर्गिक नेढं सुद्धा दिसून येते. विशेष म्हणजे याचा आकार चौकोनी आहे. किल्ल्यावरून पूर्वेकडील मोरबे धरणाचे विहंगम दृश्य दिसून येते. याशिवाय पायथ्याशी असलेल्या गावाचे दर्शनही मनास सुखावणारे असते.
या ठिकाणी कड्यास खेटून एक वाट पुढे गेली आहे व या वाटेने पुढे गेल्यावर दोन तीन माणसे बसू शकतील एवढी मोकळी जागा दिसून येते. कड्याच्या एका अंगास पाण्याचे एक टाके दिसून येते. येथून खूप दूरवरील आसमंत दृष्टीस पडतो. तेव्हा आकाराने इरसाल असा हा इर्शाळगड री एकदातरी पाहायलाच हवा.
इर्शाळगडाकडे निरखून पाहिल्यास पूर्वीच्या काळी टेहळणीसाठी या ठिकाणाचा उपयोग केला असावा याची खात्री पटते. एक दिवसात पाहून येण्यास सोयीचे म्हणून इर्शाळगड योग्य आहे. उन्हाळा सरू होण्याअगोदर हा ट्रेक करून या सिझनची सांगता करण्याचे ठरल्याने या सिझनचा शेवटचा ट्रेक इर्शाळला करण्याचे ठरले. इर्शाळला जाण्यास वाहतुकीची सोय असल्याने सोपे पडते.
इर्शाळला जाण्यास दोन मार्ग आहेत. पनवेल-खोपोली मार्गावर किंवा कर्जत-पनवेल या मार्गावर बसने प्रवास करीत चौक रेल्वे स्टेशनच्या स्थानकावर (डाक बंगला) उतरावे. रेल्वे मार्ग ओलांडून चौक गावात येताच समोरच मोरबे धरणाची िभत दिसते. त्या जलाशयाच्या बाजूला गडावर जाण्याची वाट दिसते. गाव सोडताच खडय़ा चढणीची वाट सुरू होते. सुरुवातीलाच चढण होती नि त्यात कोंदट वातावरण होते. हवेची चाहूल नव्हती.
सहाजिकच दम लागल्याने आमचा घामटा निघाला. डोक्यावर ऊन चढले होते. उन्हाळा वाढल्याने खूपच गरम होत होते. घामाच्या धारा सुरू झाल्या. सावलीला थांबून दम खात पुढचा टप्पा गाठायचो. बाजूने इर्शाळवाडीतील माणसे जात-येत होती. दम घेताना पाठमागे पसरलेल्या धरणाच्या जलाशयाचा सुंदर नजारा हीच एक दिलासा देणारी गोष्ट होती. पहिला टप्पा इर्शाळवाडीपर्यंतचा आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याला अगदी खेटून असलेली छोटी वाडी दिसत होती. हीच ती इर्शाळवाडी! वाडीत दहा-पंधरा घरे आहेत.
छोटीशी शाळा आहे. पाणी लांबून आणावे लागते. आम्हाला वाडीतील एका घरातून पाणी मिळाले. बाटल्या भरून घेतल्या. वाडीपासून निघाल्यावर सरळ वाटेने गेल्यास चुकायला होते व मोठा घेरा पडतो. वाडी सोडल्यावर देवीचे छोटेसे मंदिर दिसते. तेथून थोडेसे पुढे जाऊन वर चढल्यास फेरा वाचतो व आपण लवकर गडावर पोहोचू शकतो.
चौकहून इर्शाळगडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास लागतो. पायथ्यापासून इर्शाळवाडी माग्रे गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो. एक दिवसात पाहून येण्यास सोयीचे म्हणून इर्शाळगड योग्य आहे. गडाच्या पाठीमागून चढण्याची वाट आहे. समोरून उन्हाचा तडाखा होता. पाठीमागे गेल्यावर तेथे सावली असल्याने चढाईला वेग आला. पाण्याचे टाक पुढे लागते. लगेच पुढे लाकडी शिडी लागते. डावीकडे काही अंतरावर इर्शाळगडावरील देवीचे बिनाछपराचे देऊळ कातळकडय़ालाच लागून होते.
हेच ते विशाळादेवीचे छोटेसे मंदिर आहे. दर्शन घेऊन पुढच्या चढाईला लागलो. आता परीक्षा घेणारी चढाई होती. इर्शाळ नेढय़ापर्यंत जाणे सोयीचे आहे. शिडी चढून गेलो की समोरच नेढे स्वागतासाठी उभे ठाकते. हे नेढे तसे आकाराने छोटेच. पण त्या छोटय़ा जागेत बसून विस्तीर्ण जलाशयाचे विहंगम दृश्य बघण्याची मजा काही औरच आहे. नेढय़ातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे.
या ठिकाणी अपघात झालेले आहेत. गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अस्तित्व पाहता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान,म्हैसमाळ, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड असा सारा परिसर दिसतो. कितीही त्रास झाला तरी सर्व मित्रांसह केलेला ट्रेक आनंददायीच असतो. त्याची मजा वेगळीच असते. पुढल्या वेळी पावसाळी वातावरणात एकदा इर्शाळगडाला भेट देण्याचं ठरवत हा ट्रेक आम्ही संपवला.
https://prahaar.in/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE/
इर्शाळ(इरसाल)गड
किसी
की मुस्कराहटों पे हो निसार, किसी का गम भी मिल सके तो ले उधार..” राज
कपूरच्या गाण्याचा माझ्या मोबाईलचा रिंगटोन वाजला आणि मी फोन उचलला.
“हॅलो, अभिजीत, सारिका.”;
“बोल.”
“मी ट्रेकचा प्लॅन ड्रॉप करतेय. तुम्ही एन्जॉय करा.”
“ओके” मी फोन ठेवला.
फोन बंद करता करता सहज वेळ बघितली. सकाळचे सात. शॉक बसल्यासारखा
अंथरूणातून उठलो. इर्शाळगडाच्या ट्रेकसाठी सगळ्यांना आठला पनवेलला भेटायला
सांगितलं होतं आणि मी सात वाजेपर्यंत साखरझोपेतच…! “च्यायला, आज चांगलाच
उद्धार होणार आहे. चान्स सोडणार नाहीत हे लोक.!” झटपट तयारी करून निघायच्या
बेतात असताना परत फोन वाजला. यावेळी शीतल होती.
“अभिजीत, कुठे आहेस तू?”
“मी निघतोय आता.”
“अरे, आम्ही पनवेलला पोचलोय.”
निमूटपणे फोन बंद केला. शीतल आणि प्रगती कांदिवलीहून ठरल्याप्रमाणे आठच्या आधीच पनवेलला पोचले होते आणि अस्मादीक अजून डोंबिवलीतच. लग्नाला बाहेरगावची मंडळी येऊन हजर होतात आणि गावातली लोकं अगदी अक्षता टाकायच्या वेळेला पोचतात तसला प्रकार..! असो. सचिनसुद्धा होतो कधीकधी शून्यावर आऊट..!
ट्रेकची तयारी आदल्या दिवशी केली होतीच. बॅग उचलली आणि पनवेल स्टँडवर जाऊन पोचलो. बराच वेळ झाल्यावर गाडी मिळाली आणि तासाभरात आमची स्वारी पनवेलला हजर झाली. एव्हाना नऊ वाजले होते. ठरलेल्या शेड्युलच्या तासभर उशिरा. तोवर मंडळींनी उदरभरणाचा घाट घातला होता. ते आटपून सर्वजण मला पनवेलला स्टँडमध्ये भेटले. मग लगेच चौक इथे जाण्यासाठी सीक्स सीटर शोधली. अखेरीस दहा वाजता नितीन,वैभव,रोहित,पुष्कराज,अभिलाष अशी नेहमीची सीजीआयची गँग,प्रगती आणि शीतलची जोडगोळी आणि पहिल्यांदाच आमच्यासोबत ट्रेकला आलेला प्रणय अशी आमच्या नऊ जणांची टूर निघाली.
चौक हे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरचं पनवेलपासून सुमारे सतरा किलोमीटरवर असलेलं गाव. ते कर्जत पनवेल या नव्या रेल्वेमार्गावरचं स्टेशन देखिल आहे. पनवेलहून साधारण अर्ध्या तासात इथे पोचलो. समोरच इर्शाळगड आपल्या टोपीसारख्या माथ्यासह दिसत होता. चौकला रेल्वेमार्ग ओलांडून पलीकडे आलो. समोरच्या डांबरी सडकेवरून दहा पंधरा मिनिटं चालत गेल्यावर गडाच्या पायथ्याला असलेल्या नानिवली गावात आपण पोचतो. बाजूलाच मोरबे धरणाचा जलाशय आहे. गावात समोरच एक मोठा टेकडीवजा उंचवटा आणि त्यामागे इर्शाळगड दिसतो. प्रथमदर्शनी इर्शाळगड आणि ही टेकडी यांचं नक्की काय नातं आहे ते कळत नाही. मग उमगतं की ही टेकडी नव्हे तर गावात उतरलेली इर्शाळगडाची सोंडच आहे. इथूनच चढाईला सुरुवात होते.
अकरा वाजता चढाईला सुरुवात झाली. इतक्या उशिरा चढताना उन्हाचा त्रास होईल की काय अशी भीती वाटत होती. मात्र सूर्याजीपंत न्यू ईयर पार्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या हँगओव्हरमधून पूर्ण बाहेर आलेले नसावेत. त्यामुळे उन्हाचा कडाका फारसा जाणवत नव्हता. झपाझप चालायला सुरुवात केली. वाटेवर खुणेचे बाण होते, त्यामुळे चुकण्याची शक्यता नव्हती. सुरुवातीलाच चढण लागते आणि आपण डोंगराच्या सोंडेवरुन जसजसे वर चढू लागतो, तसतसे समोरच्या इर्शाळगडमाथ्याचे, सभोवतालच्या हिरवाईचे आणि मोरबे धरणाच्या विस्तृत जलाशयाचे विलोभनीय दृश्य बघायला मिळते. वाटेवरून चालताना लोहगडच्या “विंचूकाट्या”ची आठवण होते. वाट तासाभरात इर्शाळवाडीत आणून सोडते. इर्शाळवाडी ही दहा पंधरा घरांची वस्ती.वाडीतून समोरच गडमाथा,गिर्यारोहकांना आव्हान देणारा बेलाग सुळका आणि डोंगराला आरपार पडलेलं भगदाड,(ज्याला नेढं म्हणतात)अगदी स्पष्ट दिसतात.इथवर पोचायला आम्हाला दुपारचा एक वाजला होता. मग थोडीशी पोटपुजा उरकून घेतली. रिकाम्या होत चाललेल्या पाण्याच्या बाटल्या वाडीत भरून घेतल्या आणि पुढच्या वाटचालीला प्रारंभ केला.
इर्शाळवाडीपर्यंतची वाट फार मळलेली आणि ठळक आहे. त्यामानाने पुढची वाट तितकीशी मळलेली नाही.अर्थात खुणांचे बाण आहेतच.वाडीच्या डावीकडून जरा पुढे गेल्यावर उजवीकडे माथ्याकडे जाणारी वाट आहे.पण आम्ही गप्पांच्या ओघात बरेच पुढे निघून गेलो.मग वाटेत एका गावकर्याकडून कळलं की वाट मागे राहिली आहे.म्हणून मग जवळच्याच एका घळीतून वर चढायला सुरुवात केली.इथे भरपूर गवत होतं.त्यामुळे चालताना कसरत करावी लागत होती.वाट शोधता शोधता मी बराच पुढे निघून गेलो.बाकीचे बरेच मागे राहिले होते.बराच वेळ झाला तरी पायवाट सापडण्याची चिन्हं दिसेनात.मग मी सरळ वाडीचा रस्ता धरला. तिथे एका पोराकडून रस्ता माहित करून घेतला आणि आपल्या सोबत्यांना हाका मारत पुढे निघालो.पण त्यांना चालता चालता बाण सापडला होता आणि ते योग्य वाटेला लागले होते.ही वाट गडाच्या पश्चिम टोकाला घेऊन जाते.यथावकाश मीपण तिथे जाऊन पोचलो.वाट चुकण्याचं कारण म्हणजे नेढं आणि सुळका गडाच्या पूर्व टोकाला आहेत,तर वाट पश्चिम टोकाला घेऊन जाते. वास्तविक माथ्यावरूनच एका टोकाकडून दुसर्या टोकाला जायची निमुळती वाट आहे.
मी वर पोचल्यावर मग पुढे निघालो. आता ऊन्हाने आपलं अस्तित्त्व दाखवायला सुरुवात केली होती.बाणाच्या वाटेने पुढे निघालो.इथपर्यंतची वाट तशी सोपी आहे.पण यापुढची वाट अगदी डोंगरकडेने जात असल्यामुळे थोडी सावधगिरी बाळगावी लागते.वाटेत एक मोठी कपार लागते.तिथे ‘भ्रमंती’ ग्रुपचे काही जण विसाव्याला थांबले होते.त्यांच्याजवळ प्रस्तरारोहणासाठी आवश्यक दोर वगैरे सगळी सामग्री दिसत होती.सुळका सर करून आराम करत बसले होते.त्यांच्याकडून पुढची माहिती घेतली.पुढे थोडं कातळावर प्रस्तरारोहण करून नेढ्यापाशी पोचलो.वाटेत एक शिडीही आपली मदत करते.नेढ्याच्या तोंडाशी अमित देशमाने नावाच्या कुणा गिर्यारोहकाच्या नावाची संगमरवरी पाटी दिसते. तसंच वरच्या सुळक्याच्या पायाशी देखिल कुमार प्रकाश दुर्वे याच्या नावाची पाटी आहे. २३ जानेवारी १९७२ रोजी सुळक्यावरून पडून त्याचा दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला मुंबई ठाण्याचे गिर्यारोहक इथे जमतात. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळावं पण सावधपणे, नाहीतर अशा दुर्घटना होतात. सर्वसामान्यांच्या मनात गिरीभ्रमणाबाबत उगीचच चुकीच्या कल्पना घर करुन बसतात आणि एका आनंददायी छंदाला कायमचं मुकण्याची शक्यता निर्माण होते. असो.आम्ही ही सगळी माहिती आधीच जमा केली होती आणि त्यानुसार काळजी घेतच इथवर पोचलो होतो.प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत नसणार्यांनी नेढ्यापर्यंतच जाणं इष्ट.नेढ्यातून प्रबळगड, माथेरान आणि मोरबे धरणाचा प्रदेश सुरेख दिसतो.
नेढ्यापाशी जवळपास तासभर विसावा घेऊन आणि फोटोसेशन वगैरे आटपून साडेतीनच्या सुमारास परतीच्या वाटेला लागलो. चढताना केलेल्या कसरतीसारखी उतरतानाही नवशिक्या ट्रेकर्सना थोडी कसरत करावी लागते. सव्वाचारच्या सुमारास पुन्हा वाडीत दाखल झालो. यावेळी व्यवस्थित वाट धरल्यामुळे वाटेवर असलेले देवीचे छोटेखानी मंदीर बघायला मिळाले. वाडीत पुन्हा पाण्याची तरतूद करून खाली उतरायला सुरुवात केली.मुबलक वेळ असल्यामुळे रमतगमत उतरलो.वाटेत एका ठिकाणी मस्त विसावलो. भन्नाट वारा येत होता आणि फोटोग्राफीची मंडळींची हौस अजून पुरी झाली नव्हती. मग काय विचारता, सगळ्या परमुटेशन,कॉम्बिनेशन,पोझ वगैरे वापरून भरपूर फोटो काढून झाले.
अखेर पाच वाजता मंडळी पुढे निघायला उठली.अर्ध्या पाऊण तासातच पायथ्याच्या गावात पोचलो.धरणावर एक फेरफटका मारला आणि सव्वासहाला पुन्हा हायवेवरच्या चौक थांब्यावर हजर झालो.पनवेलला जाणारी सीक्स सीटर पकडली आणि सव्वासातला पनवेलला हजर झालो. पश्चिम उपनगरात राहणार्या दोस्तांना साडेसातची पनवेल-अंधेरी लोकल मिळाली आणि आम्ही सेंट्रलवाल्यांनी केतकी उपहारगृहाकडे मोर्चा वळवला.मग एकेक जण आपापल्या घराकडे रवाना झाला.साधारण साडेनऊला मी घरी पोचलो. एका मस्त ट्रेकची सांगता झाली.
हा ट्रेक तसा सर्वांनाच सोयीचा ठरला. जास्त परिचित ट्रेक नसला तरी जवळचा असल्यामुळे कुणालाच त्रास झाला नाही आणि अगदी रमतगमत ट्रेक पूर्ण झाला. नव्या वर्षाचा पहिला रविवार मस्त सार्थकी लागला. कोण म्हणतं की फक्त थर्टी फर्स्ट च्या पार्टीचाच हँगओव्हर राहतो असं. अशा ट्रेकचा हँगओव्हर कितीतरी पटीने अधिक असतो. पण तुमच्यात दुर्गभ्रमणाची झिंग हवी, कातळाला भिडण्याची जिद्द हवी आणि निसर्गाशी जवळीक साधण्याची आत्मीयता हवी. मग साधा ट्रेकच काय, आयुष्याचा ट्रेकसुद्धा मस्त सोपा होऊन जातो. आणि डोंगर कितीही मोठा असो, त्याच्या पोटात कुठेतरी मधुर पाण्याचं टाकं सापडतंच, तसंच आपल्या आयुष्यातदेखील असंच समाधानाचं टाकं सापडल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
हर ट्रेक कुछ कहता है..!
— अभिजीत दाते

ट्रेकचे शिलेदार (डावीकडून वैभव, रोहित, अभिलाष, पुष्कराज, प्रणय, मी , प्रगती, शीतल , आणि बसलेला नितीन)
https://dilkhulas.wordpress.com/2018/06/03/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A1/
मनमोहक "इर्शाळ"
पावसाचा जोर सरला की सह्याद्रीमध्ये निसर्गाचे रंग अधिक उठून दिसतात.. वातावरण स्वच्छ बनते.. दुरदूरची डोंगररांग नजरेस पडते.. उनामध्ये हिरव्या गवताचा व पिवळ्या सोनकीचा रंग अधिक भडक वाटतो.. फुलपाखरांची उधळण होते... जणू सरत्या पावसाला प्रेमळ निरोप देण्याची तयारी सुरू होते नि ही तयारी कितपत हे पाहण्यासाठी आमचा मग एक छोटासा ट्रेकही होतो.. ! एक दिवसात पाहून येण्यास सोयीचे म्हणून ठरले 'इर्शाळगड' !
अनिरुद्धने सहज विचारले मी पटकन हो म्हटले मग सौ. रॉक्स म्हणे मी पण येणार सो आम्ही तिघेच दादर-कुर्ला करत पनवेल रेल्वे स्थानक गाठले.. सकाळचा भन्नाट नाश्ता व्हावा म्हणून अनिरुद्धने आम्हाला हॉटेल 'विसावा' इथे आणले.. पण हॉटेलमध्ये अगोदरच एका ट्रेकिंग ग्रुपची जत्रा विस्थापित होती.. अनिरुद्ध व मला हा ग्रुप कोणता हे कळायला वेळ लागला नाही.. कारण आमच्या दोघांची ओळख ह्या ग्रुपने कुण्याकाळी आखलेल्या एका ट्रेकमध्येच झालेली.. असो आम्ही असे गर्दी करणाऱ्या ग्रुपपासून कधीच निरोप घेतलाय.. हॉटेल हाउसफ़ुल्ल असले तरी 'थांबेन पण मिसळपाव खाउनच जाइन' म्हणून थांबलो.. तोच मागून अजुन एक कुठलातरी ट्रेकींग ग्रुप गर्दी घेऊन आला ! जल्ला त्या हॉटेलची पहिल्या दोन-तीन तासांतच दिवसभराची कमाई होणार होती..
भरपेट मिसळपाव व पोहे हादडून आम्ही मार्गस्थ झालो.. खाताना कळले एक गर्दी कलावंतीण गडावर जाणार होती पण दुसरा ग्रुप मात्र इर्शाळगडावरच येत होता..! गडावर गर्दी टाळणे आता अशक्य होते.. आम्ही स्थानाकातून चौक ला जाणारी एसटी पकडली.. वाटेत डावीकडे लागणारे कलावंतीण व प्रबळगड तर उजवीकडे माणिकगड यांचे दुरूनच दर्शन घेत आम्ही चौकात पोचलो.. रेल्वेरुळ ओलांडून इर्शाळगडाचा रस्ता धरला..
- - -
अगदी हवा तसाच नजारा होता.. रस्त्याच्या दुतर्फा सोनकी व तेरड्याने सजलेली हिरवाई व त्यावर भुणभुणारे भुंगे नि समोर दुरवर ढगांमध्ये खुपसलेली इर्शाळगडाची दोन शिंग म्हणजेच माथा ! इतका सुंदर देखावा कॅमेऱ्यात बंदीस्त करावयाचा तर नेमका अनिरुद्धच्या कॅमेऱ्याला अटॅक यावा !!
आम्ही धरलेल्या वाटेला पुढे दोन फाटे फुटले.. एक वाट डावीकडे गावात वळते तर दूसरी उजवीकडे मोरबे धरणाच्या बाजूने वळसा मारत जाते.. आम्ही गावातून जाणाऱ्या वाटेने वळलो.. गाव सोडताच खड्या चढणीची वाट सुरु होते.. सुरवातीलाच चढण नि त्यात कोंदट वातावरण होते.. हवेची चाहूल नव्हती.. साहाजिकच आमचा घामटा निघाला.. दोनेक मिनिटांनी ब्रेक घेतला जात होता.. दम घेताना पाठमागे पसरलेल्या धरणाच्या जलाशयचा सुंदर नजारा हीच एक दिलासा देणारी गोष्ट होती !
- - -
पहिल्याच दोन टप्प्यात पुरती दमछाक झाली.. पुढे गेलेल्या ग्रुपशी गाठ झाली तेव्हा अंतर ठेवण्याच्या निमित्ताने एक छानसा कडा पाहून मोठा ब्रेक घेण्याचे ठरवले.. चार-पाच भल्या मोठ्या खडकांची गादी असलेल्या कड्यावर एव्हाना सॅक काढून पाठ टेकवलेली.. खाली पाहिले तर गर्द हिरव्या झाडीने भरलेली खोल दरी.. वाराही नसल्याने पूर्णतः शांतता.. फ़क्त कुठून तरी वाहत्या पाहण्याचा खळखळाट कानी पडत होता.. एखाद दूसरा पक्षी त्या खोल दरिवर विहंग करत लक्ष वेधून घेत होता.. दरीच्या पल्ल्याड सहयाद्रीची पसरलेली एक भिंत आपली भव्यता दर्शवत होती.. बहुदा प्रबळगड असावा.. तिथे इर्शाळगडाच्या माथ्यावरील ढगांचे ग्रहण आता कुठे सुटत होते.. इर्शाळगडाच्या पायथ्याला अगदी खेटून असलेली छोटी वाडी दिसत होती.. इर्शाळवाडी ! अजून बराच पल्ला गाठायचाय हे लक्षात आले नि लेटस गो केले..
- - -
- - -
पुन्हा चढण सुरु.. वाडीचे अंतर नि तिथून पुन्हा माथ्यापर्यंत चढायचे हा खटाटोप पाहून स्मिताने आपण वाडीतच थांबू असे घोषीत केले.. कोंदट वातावरणात दमछाक तर सगळ्यांचीच झालेली.. पावसाने नाही तर घामाने चिंब झालेलो.. धिम्या गतीने चढाई सुरु होती.. मला सुरवातीपासूनच वातावरणामुळे त्रास झालेला शेवटी कंटाळून एका आपट्याच्या वृक्षाची 'सोन्याची' सावली बघितली नि बसकण मारली.. दोघांना पुढे व्हायला सांगितले.. पाठीवरची सॅक उतरवली नि पाणी पिऊन शांत बसून राहीलो.. काही मिनिटांतच फ्रेश वाटले नि चालू पडलो..
एव्हाना वातारवरण स्वच्छ होऊ पाहत होते.. पुढे गेलेले दोघे माझी वाट पाहत असतानाच मी त्यांना जाउन भेटलो.. पठार लागले नि समोरचा इर्शाळगड आपले नेढे दाखवू लागला... योग्यवेळी आकाश अगदी स्वच्छ झाले.. निळयाभोर आकाशात गडाचा अगदी उठून दिसत होता.. उजवीकडे माथेरानचा डोंगर अगदी स्पष्ट दिसत होता..
वाडीत पोहोचलो.. जवळपास कुठे पाणी मिळेल म्हणून एका छोट्या घरात विचारणा केली.. तोच घरातल्या मुलीने पाण्याचा हंडा समोर ठेवला.. घरात बहिण-भाऊ दोघच होते.. आम्ही दारातच शेणाने सारवलेल्या पायरीवर बसलो.. इथेच मग त्या छोट्यांसोबत गप्पा मारत थोड़ी पेटपुजा केली.. त्या घरच्या अंगणातील कोंबड्याही आमच्या खादाडी कार्यक्रमात सहभागी झाल्या व आमच्यासाठी करमणुकीचा विषय मिळाला.. ! या वाडीतल्या लोकांचे राहणीमान अगदी प्रबळगडाच्या माचीवरील वस्तीसारखे.. राशनसाठी डोंगर उतरून चौकात जावे लागते !! आपण तर नाक्यावरच्या दुकानातून काही आणायचे तरी नाक मुरडतो...असो जवळपास अर्ध्यातासाच्या वेळेत थकवा एकदम निघून गेला.. आता स्मिताही गडावर येण्यास राजी झाली.. गडावर जाउन पुन्हा येतो असे त्या छोटयांना सांगत निघालो..
आमच्या अगोदरचा ग्रुप एव्हाना वरती पोहोचलेला.. त्यामुळे आता पुन्हा आम्ही त्रिकुटच होतो..गावाच्या पुढे एक नारळाचे झाड़ नि छोटी देवळी या वाटेतल्या खुणा लागल्या.. वाट तशी ठळकच.. काही अंतरानंतर या वाटेला पुसटसा फाटा फुटून वरच्या बाजूस पाउलवाट जाते.. पण नेमके याचठिकाणी तीन-चार पुणेकरांचा ग्रुप लागला नि त्यांना हाय हॅलो करण्याच्या नादात आम्ही सरळ गेलो ! इथे कसलाही मार्गदर्शक फलक नव्हता ! आता आम्ही नकळत चुकीची वाट धरलेली.. पण काही मिनिटातच लक्षात आले.. कारण ही वाट इर्शाळगडाला उजवीकडे ठेवत अगदी सरळ जात होती.. शिवाय वरती पोचलेल्या मंडळीचा गोंगाट ऐकू येत होता..नक्कीच बिनसलेय हे लक्षात आले.. वितभर असलेली वाट ठळक होती.. पण चुकलोय हे नक्की होते..
मी वाट पुढे कुठे वर सरकते का म्हणून थोड़े पुढे गेलो नि थांबलो.. मागून स्मिता येत होती तिला थांब सांगायला वळालो तर तिच्यापासून एका पावलावर वाटेत छोटा साप आपले तोंड काढून निपचित पडलेला दिसला.. ! आधी वाटले माझा पाय पडून टपकला की काय ! पण होता जिवंत.. अनिरुद्धनेे बिनविषारी असल्याचे ओळखले.. फोटो काढणार तोच त्याने वाट ओलांडली.. ! याचेच दर्शन घडावे म्हणून वाट चुकलो बहुतेक !
माघारी फिरुन गावकरीला वाट विचारुन आम्ही आता मुख्य वाटेला निघालो.. साहजिकच चढणीची वाट सुरु झाली.. काही मिनिटातच आम्ही वरती पोचलो नि समोर इर्शाळगडची कातळभिंत उभी राहिली..
- - -
- - -
सोनकी- तेरड्याच्या फुलांनी वाट अगदी सुशोभित बनलेली.. या भिंतीच्या डाव्या बाजूने वाट पुढे सरकते.. आतापर्यंत गर्मीने हैराण झालेलो पण या कातळभिंतीच्या सावलीत आलो नि विलक्षण गारवा वाटू लागला.. वाटेत पुढेच बऱ्यापैंकी मोकळी जागा लागते जिथे खडकांची रास पडली होती.. इथेच पुढे आलेल्या ग्रुपच्या सॅक पडल्या होत्या व त्यांची राखण करत एकजण थांबलेला दिसला.. खरेतर तो पूर्णपणे थकला होता नि चेहऱ्यावरुन त्याचा पहिलाच ट्रेक होता हे आम्ही पटकन ओळखले.. हालतच त्याची वाईट झालेली.. इथून पुढची वाट अगदी अरुंद असणार होती शिवाय एक कातळटप्पा लागणार होता तेव्हा गर्दी नको म्हणून आम्ही शिदोरी उघडली..
पेटपूजा झाली तशी तिथेच वामकुक्षी घेण्याची हुक्की आली नि पंधरा मिनिट का होईना आडवे झालो.. पुढे गेलेला ग्रुप काही अजुन परतला नाही तेव्हा मग आम्ही पुढची वाट धरली.. तो नवख्या मात्र त्यांची वाट बघून वैतागला होता.. मित्राच्या सांगण्यावरून हा नविन बाला उत्सुकतेपोटी ट्रेकला येउन चांगलाच फसला होता.. तो गोरगोमटा उनात करपटून जल्ला लालेलाल टमाटर बनला होता ! पुढची वाट सरळ कारवीच्या तंबूत शिरत होती..
कड्याच्या बाजूनेच जाणारी ही वाट तंबूच्या दुसऱ्या बाजूने पडली कि डावीकडे मस्त ohlala दरी नि उजवीकडे कातळकड्यालाच हात घालणारी वाट ! इथेच सोप्पा वाटावा असा कातळटप्पा नि छोटीशी शिडी ! सोप्पा काय कठीण काय काळजी घेणे मात्र अपरिहार्य ! पण पुढे गेलेल्या ग्रुपचा नेमका इथेच गरदोळ सुरु होता.. ढिसाळ नियोजन आमच्या पटकन लक्षात आले ! जिथे कातळटप्प्याचा चढ़ सुरु होतोय ती जागाच जेमतेम दोघे उभे राहतील इतकी अरुंद.. इथे घसरणीचा छोटासा कातळकडा होता व उजवीला लागूनच पाण्याच्या दोन छोट्या टाक्या होत्या.. तर डावीकडे काही अंतरावर इर्शाळगडावरील देवीचे बिनाछप्पराचे देऊळ कातळकडयालाच लागून होते..
त्या ग्रुपचे पुढारीलोक्स वरती जिथे ढिसाळ शिडी लावालेला कातळटप्पा आहे तिथेच फ़क्त त्यांच्या मेंबरांसाठी फिल्डिंग लावून होते.. वरती गेलेल्ल्यांपैंकी एकेकाला खाली सोडत होते.. पण गंमत अशी की वरतून सहीसलामत सुटले तरी खालच्या अंगाला असलेला घसरणीचा आठफुटी टप्पा ओलांडताना मेंबरांची तारांबळ उडत होती.. जो तो आपापल्या स्टाइलने फरफटत उतरत होता ! नेमके इथेच कोणी खालून मार्गदर्शक म्हणून उभे नव्हते ! त्यात फारच अरुंद जागा नि मागे कारवीच्या झाडीत लपलेली दरी ! त्यांची तारांबळ व समोर खोल दरी बघून स्मिताने पण धीर सोडला.. तिला शांत करुन शिस्तीत बाजूच्या टाक्यांच्या कडेवर बसलो तर आमचे अनिबाबा मार्गदर्शक म्हणून लिडरच्या भूमिकेत शिरले !
एवढ्या अरुंद जागेत त्या ग्रुपची बरीच फलटाण वरती गेली होती.. यांना उतरेपर्यंत आम्हाला वाट बघणे शक्य नव्हते.. आतापर्यंत मार्गदर्शनाबद्दल 'थँक्स' च्या शुभेच्छा मिळवलेल्या अनिरुद्धने मग वैतागून घूसखोरी केली नी वरती जाऊन त्या पुढारीलोकांना खाली पण एकाने राहण्याची सूचना केली... नशिब नाहीतर मला वाटत होते की हा आता त्याच ग्रुपची लीडरशीप घेतो की काय..
आता आमची कसोटी होती.. अनिरुद्ध पाठोपाठ आम्ही दोघे घूसखोरी करण्यास सरावलो.. तो घसरणीचा कातळकड़ा पुढे आखूड शिडीचा कातळ टप्पा हे सगळे अंतर स्मितासाठी अवघडच होते नि जल्ला आता मी मार्गदर्शक होतो !
शिडी चढून गेलो की समोरच नेढे स्वागतासाठी.. हे नेढे तसे आकाराने छोटेच.. पण ह्या छोट्या जागेत बसून विस्तीर्ण जलाशयाचे विहंगमय दृश्य बघण्याची मजा काही औरच.. या नेढयातून बाहेर पडलोे की डावीकडून नेढयाच्या वरती जाण्यास वाट आहे.. इथेच शिंग सदृश दोन कातळ सुळके समोरासमोर आहेत.. हाच सर्वोच्च माथा ! इथल्या एका सुळक्याच्या दोन्ही बाजूने जाणारी वाट आहे.. उजव्या बाजूच्या वाटेने गेलो तर एक कपार लागते.. उलट डाव्याबाजूने गेलो तर पाण्याच्या टाक्या नजरेस पडतात..
- - -
- - -
- - -

हे सगळे बघेपर्यंत आकाशात ढगांची भरती सुरु झाली तेव्हा अवेळी पाऊस नको म्हणून उतरायला घेतले..
- - -
- - -
- - -

पुन्हा नेढयापाशी आलो तर त्या ग्रुपचे कातळटप्प्याशी लागलेले ग्रहण नुकतेच सुटत होते..आम्ही त्या ग्रुपला मागे टाकून पुढे निघालो.. गडावर पाहण्यासारखे विशेष काही नसले तरी पावसामुळे हा परिसर भलताच मोहात पाडतो.. या डोंगराच्या सोंडेवरून जाताना एक आगळाच हुरुप येतो नि याच जोशात मग माझी ट्रेकमार्क उडी होते !
पुन्हा त्या वाडीतल्या घरापाशी आलो.. पाणी पिउन फ्रेश झालो नि त्या छोट्यांना आदरतीथ्य दाखवल्याबद्दल मोबादला देऊन आम्ही निरोप घेतला.. चढताना अंगावर येणारे चढ आता उतरताना अगदीच लेचेपेचे वाटत होते !
संध्याकाळची वेळ झालेली नि वाटेत अवजड ओझी घेऊन चढणारे वाडीतले रहिवाशी भेटत होते... आठवडयाभरचा राशनसाठी एवढा खटाटोप..
सगळे डोंगर उतरून एकदाचे खालच्या गावात पोहोचलो.. या गावात बाहेरचे कोणी दिसले तर खाऊ मागायचा ही जणू सवयच इथल्या मुलांना लावलेली दिसते.. जो तो खाऊ असेल तर देना म्हणून मागत होता.. सकाळी आलो तेव्हा नि आता परत जाताना पण.. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की फ़क्त ह्यांनाच् खाऊ देऊन संपवू नका.. याउलट वरती इर्शाळवाडीत राहणाऱ्यांना मदतीची जास्त गरज आहे.. नि एवढे असूनही त्या वाडीत मात्र असा अनुभव आला नाही !
असो कधीपासून इर्शाळगड नाव फ़क्त ऐकतच होतो पण येणे झाले नव्हते.. आज झालेली भेट एकदम मस्त होती व खरच एका दिवसात ट्रेक करण्यासाठी उत्तम जागा ! अर्थात या यादगार ट्रेकची सांगता मग पनवेलला सामिष जेवण करूनच केली !
https://www.maayboli.com/node/53060
इरशाळगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : रायगड
उंची : १८२० फुट
श्रेणी : कठीण
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताना अनेक गिरिशिखरे नजरेस पडतात. जातिवंत
दुर्गप्रेमी वगळता इतरांना यातील नेमके किल्ले कोणते हे ओळखणे तसे कठीणच.
यातील घाटमार्गाच्या खाली अगदी सहजपणे नजरेस पडणारे किल्ले म्हणजे पांडवगड,
प्रबळगड,कर्नाळा,माणिकगड आणी इरशाळगड. मुंबईच्या जवळच असल्याने या सर्व
किल्ल्यांची भटकंती एका दिवसात सहजपणे करता येते. इरशाळगड हा रायगड
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेला असाच एक किल्ला. गडावरील
विशाळादेवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव ईरशाळगड झाले असावे.
मुंबईहून जुन्या मुंबई- पुणे हायवेने जाताना चौक फाट्या अलीकडे २ कि.मी.वर
इरशाळगडला जाणारा फाटा आहे. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या
गावापर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहनाची सोय होते. रस्ता विचारताना इरशाळगड न
विचारता ठाकरवाडी विचारावे कारण इरशाळगड वाडीपर्यंत रस्ता जात नसुन
ठाकरवाडी पर्यंत जातो.
इरशाळगड वाडी हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव असुन ठाकरवाडीतुन तिथपर्यंत चालत
जाण्यासाठी दीड तास लागतो. या वाटेने इरशाळगड वाडीचा चढ चढताना इरशाळगडाचे
सुळके आणि नेढं नजरेस पडते. इरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. इरशाळ माचीतुन
गडावर जातांना आधी डावीकडील सोंडेने वर चढुन नंतर कडयाच्या मागील बाजुने
गडावर जाणारी वाट आहे. सुरवातीस कड्याशी सोपे प्रस्तरारोहण करत आपण गड
चढायला सुरवात करतो. वाटेत पाण्याचे एक टाकं आहे. येथे एक लाकडी शिडी
बसवलेली आहे. शिडी चढण्यापूर्वी डावीकडे एका कपारीत विशाळा देवीची मुर्ती
बसवलेली आहे. तेथून पुढे शिडी चढून व सोपे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या
नेढ्यात पोहोचतो. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर डावीकडे पाण्याचे एक टाकं
असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पण हे पाणी मार्च पर्यंतच असते. या
टाक्याशेजारी एक कपार असुन येथुन प्रबळगडाच्या मागील बाजूचे सुंदर दर्शन
घडते. इरशाळगड वाडीतून इथपर्यंत येण्यास एक तास लागतो. नेढ्यातून समोर
चढणारी वाट सुळक्यावर जाते. प्रस्तरारोहणाचे तंत्र व सामान वापरून
सुळक्यावर जाणे शक्य असले तरी या सुळक्यातील दगड ठिसुळ असल्याने वर चढणे
धोकादायक आहे. याआधी बऱ्याच गिर्यारोहकांचा येथे मृत्यु झाला असुन
त्यांच्या नावाच्या पाट्या या नेढ्याजवळ लावण्यात आल्या आहेत. नेढ्याजवळुन
समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर नजरेस
पडतो. इरशाळगड म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. इरशाळगडावर पाण्याचे टाके व
काही कोरीव पायऱ्या वगळता इतर कोणतेही अवशेष नसल्याने हा किल्ला आहे का? हा
प्रश्नच आहे. इरशाळगडाचा इतिहासात उल्लेख आढळत नसल्याने त्याला गड म्हणणे
योग्य ठरणार नाही. यावरील पाण्याच्या टाक्या पहाता हे केवळ एक पहाऱ्याचे
अथवा टेहळणीचे ठिकाण असावे असे वाटते. इरशाळ गडाचा इतिहासात उल्लेख आढळत
नाही. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख
घेतला तेंव्हा त्यामध्ये हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा.
स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर यांचा जन्म इरशाळगडाच्या पायथ्याजवळ
असलेल्या चौक गावात झाल्याचे मानले जाते. प्रस्तरारोहणाचा आनंद व आसपासचे
निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी एकदा तरी इरशाळगडला भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar
खोपोलीहून पनवेलकडे जाऊ लागलो, की उजव्या हाताला एक सुळका असलेला डोंगर सगळय़ांचेच लक्ष वेधून घेतो. इर्शाळगड असे या गिरिदुर्गाचे नाव. पुणे-मुंबई महामार्गावरील चौक गावातून या गडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पायथ्याशी इर्शाळवाडी नावाचे गाव आहे. या गावातून दोन तासात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. चौकीवजा ठाणे असलेल्या या गडावर नेढे आहे. हे नेढे म्हणजे इर्शाळची जणू खिडकीच. या गडावरून कर्नाळा, प्रबळगड, माणिकगड, माथेरान असा मोठा मुलुख दिसतो. इर्शाळगडचा सुळका चढण्यासाठी मात्र गिर्यारोहणातील तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.
तीन-चार वर्षापूर्वी एका ट्रेकिंग ग्रुप बरोबर मी इर्शाळगड ट्रेक केला होता. त्यावेळी हि सप्टेंबर महिन्याचा शेवटी म्हणजेच पावसाळ्या संपल्यानंतर केला होता. आणि आता
हि त्याच महिन्यात केला पण मित्रां सोबत. तीन चार वर्षांपूर्वी, मला
झालेल्या ऊन्हाचा त्रास तसेच वाटेत आडोसा घेण्यासाठी ठराविक लक्षात
राहणारी छोटी मोठी झाडे. आणि गडाचा निमुळता माथा, आणि गडावर विशेष असा
ऐतिह्यासिक वास्तू काही आढळत नाही. त्यामुळे मी हा ट्रेक पुन्हा करणार
नाही. हे मी त्यावेळीच ठरवलं होता.
पण प्रणव बरोबर कुठच्या किल्ल्यावर
जायायचे ठरवत असताना, मी दुसरा टकमक किल्ला सुचवला होता, पण तो हि मी
हल्लीच एकट्याने केला होता, हे माझ्या लक्षात राहिले नाही. नंतर मग लक्षात
आले. त्यामुळे मीच फसलो, मग काय टकमकला न जाता इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी जायायला लागले. त्यात प्रणवने पण हा ट्रेक केला नव्हता.
प्रणवने त्याचा मित्र सुरज बरोबर आधीच हा
गड करायचा ठरवलं होता. पण माझा शेवटचा वेळी जायायचा ठरला. त्यामुळे मी
दुसरे पर्याय सांगितले पण वर सांगितल्याप्रमाणे मला ह्या गडावर जायायला
लागले.
गडावर गेल्यावर लक्षात येते, गड म्हणजे नावाला आहे.
मला इर्शाळ गडाचा इतिहास किंवा काही अन्य बाकी गोष्टी बद्दल माहित नाही .
पण मी पाहिल्यानंतर मला गडाबद्दल काय अंदाज आला, ते थोडक्यात ह्या विभागात
सांगतो. हा दुर्ग पनवेल, कर्जत भागावर लक्ष्यठेवण्यासाठी वापरत असावे.
ह्या किल्ल्याला टेहळणीचा किल्ला हि बोलू शकतो . गडावर फक्त पाण्याचा
टाकी आहेत, बहुतेक तेथे टेहळणी करण्याऱ्या सैनिकांसाठी पाण्याचा सोयी साठी
कातळात खोदल्या असाव्या. तसेही गडाचा उत्तरेला प्रबळगड सारखा मुख्य गड
आहे. त्यामुळे येथे बहुतेक फक्त टेहेळणी साठी वापरात असावे. असा माझा
अंदाज आहे.
गडावर फक्त पाण्याचा दोन छोट्या टाकी आहेत. बाकी गडाला बुरुज, तटभिंत वगैरे काही दिसत नाही.
इर्शाळगडचा पायथ्याचा गावापर्यंतचा प्रवासाचे वर्णन
ठरल्या प्रमाणे आम्ही तिघे ७ ला पनवेल
स्थानकावर भेटलो. तेथून आम्ही पनवेल एसटी डेपोत गेलो. डेपोच्या समोरचा
हॉटेल मध्ये नाश्ता केला. नंतर पुन्हा डेपोत येऊन कर्जत एसटीचा वेळ विचारला. पनवेल ते इर्शाळगड अंतर रस्त्याने अंदाजे १५ कमी आहे. कर्जत ला जाणारी ८. १५ ची एसटी होती. त्या एसटी ने आम्ही जुन्या मुबई-पुणे महामार्गावर चौक रेल्वे स्टेशन थांब्याला उतरलो. आम्हाला चौक स्थानकाला पोहचे पर्यंत ८. ४५ वाजले.
महामार्गावरून
गडाचा पायथ्याचा गावाचा अंतर अंदाजे दोन किलोमीटर आहे. हे अंतर पायी पार
करायला २० ते २५ मिनिट लागतात . महामार्गावरून एक रस्ता स्थानकाजवळ जातो.
तेथून रेल्वेचा पादचारी पूलने आम्ही पलीकडे गेलो. स्थानकातून बाहेर
आल्यावर डावीकडे रस्ता सरळ इर्शाळगडाचा पायथ्याचा गाव नानिवली गावात जातो.
रस्ता जिथे संपवतो तिथेच एक सरळ वाट गडावर जाते. त्यामुळे चुकण्याचा काही
प्रश्नच येत नाही.
इर्शाळगडला कसे पोहचावे थोड्यकात
मुंबई लोकल ट्रेन ने पनवेलला पोहचावे.
पनवेल वरून कर्जतला जाणारी एसटी पकडावी.
कर्जत एसटी ने चौक रेल्वे स्थानकाला उतरावे.
पनवेल ते इर्शाळगड अंतर रस्त्याने अंदाजे १५ किमी आहे.
गडावर चढायला सुरवात केल्याचे वर्णन
गडावर
जाणारी वाट इर्शाळवाडी शिवाय कुठे हि दुसरीकडे वळत नाही, आणि आम्हाला
दुसरी वाट दिसली पण नाही. त्यामुळे तुम्ही न चुकता इर्शाळवाडीत पोहचतात.
आम्ही नांनिवली गावातून ९. १५ ला चढायला सुरवात केली, आम्हाला इर्शाळवाडीत
पोहचायला ११ वाजले. सकाळचा उन हि खूप जाणवत होता आणि गरमी पण होत होती. त्यात आम्हाला पूर्ण गड चढेपर्यंत जरा सुद्धा वारा लागला नाही, त्यामुळे आम्ही बरेच ठिकाणी थांबत थांबत चालत होतो.
इर्शाळवाडीत पोहचल्यावर डाव्याबाजूने एक वाट इर्शालकर्णी देवीचा मंदिराजवळ जाते, त्या वाटेने जावे. वाडीत आल्यावर गड दिसत नाही. पण आपल्याला ज्या दिशेला गडाची मोठी लांब सोंड उतरते, त्या दिशेने जायायचा आहे हे लक्षात ठेवावे. इर्शालकर्णी देवीच्या मंदिरजवळूनच वाट पुढे जाते. वाडीतून जरी वाट मिळाली नाही तरी गावातील कोणीही व्यक्ती तुम्हाला सांगेल.
मंदिराजवळून
थोडे पुढे गेल्यावर एक ठिकाणी वाट उजवीकडे वर जाते. तिथून पुन्हा फिरून
सोंडेचा दिशेने वर वर जाते. सोंडेवरून आपण वर चढायला सुरवात केली कि, सोंडेवर
एक ठिकाणी वर आल्यावर गडाचा छोट्या सुळक्याचा कातळ लागतात आणि पहिला एक
सुळका हि दिसतो. हा कातळ म्हणजेच मोठी दगडी. बहुतेक ट्रेकर सोंडेवरून सरळ
वर कातळावर चढायला लागतात. त्यामुळे ते गडावर पोहचत नाही.
त्यामुळे सोंडेवर जिथे आपल्याला कातळ लागतो किंवा मोठे दगड
लागतात, ते सरळ न चढत जाता. जेथे कातळ किंवा दगड लागतात तेथून आपल्या
डाव्या बाजूने, गडाच्या दुसऱ्या बाजूला एक वाट जाते. हि वाट गडाचा
सुळक्यांचा पायथ्याने सरळ जाते. या वाटेने गडाचा शेवटचा टोकापर्यंत पुढे न
जाता, मधेच हि वाट कातळातून वर गडावर जाते. वर जाणारी वाट आपल्याला सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे नीट लक्ष ठेवावे लागते. नाही तर तुम्ही चुकून
पुढे जाऊन शकता. वाट नक्की कुठून वर जाते, हे लक्षात ठेवण्यासाठी जेथे
गडाचा नेढा दिसतो किंवा गडाचा मोठा सुळका आणि दुसरा टोकाचा सुळका ह्यांचा
मधला भाग आहे, त्या जागेचा खालूनच वाट गडावर जाते. हे लक्षात ठेवलात तर
तुम्हाला वाट शोढायला सोपी पडेल.
गडावरील वर्णन
ह्या
वाटेने कातळातून वर चढायला सुरवात केल्यावर, आपल्याला पहिली एक छोटी
कातळातील टाकी लागते. त्या टाकीचा वरती एका ठिकाणी कातळ चढायला अवघड
असल्यामुळे ३ फुटाची छोटी लाकडाची शिडी लावलेली आहे. शिडीचा डाव्या बाजूला
एके ठिकाणी काही अंतरावर उघड्यावर एका देवीची पाषाणाची मूर्ती आहे. .ते
उघड्यावरील मंदिर प्राचीन दिसत नाही.
शिडीने
वर चढल्यावर अजून दोन ते तीन ठिकाणी चालून गेल्यावर आपण नेढ्या जवळ
पोहचतो. नेढ्या जवळून उजवीकडे एक छोटा सुळका लागतो. त्या सुळक्यावर
जायायला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पण त्या पायऱ्या झिजलेल्या
अवस्थेत आहेत. त्यामुळे ह्या सुळक्यावर चढतेवेळी तसेच विशेष करून उतरतेवेळी
सांभाळून जावे. जास्त करून कमी अनुभवी ट्रेकर ने टाळावे. कारण सुळक्यावर
बुरुज किंवा प्राचीन खुणा काहीच आढळत नाही.
नेढ्याजवळ आल्यावर नेढ्यातून पलीकडे जाऊन डावीकडे वाट वर मोठ्या सुळक्याजवळ जाते.
ह्या वाटेने आपण मोठ्या मुख्य सुळक्याजवळ पोहचतो. मोठ्या सुळक्याचा
कातळाजवळ आल्यावर, सुळक्याचा दोन बाजूला जायायला, दोन वाटा लागतात.
डाव्याबाजूचा
वाटेने गेल्यावर, थोडा पुढे गेल्यावर आपण कातळावर खोदलेल्या टाकी जवळ
पोहचतो. टाकीजवळ जाणारा रस्ता निमुळता असल्याने जपून जावे लागते , तसेच
टाकी जवळ बसायला जास्त जागा हि नाही आहे.
टाकीकडील बाजूने आपल्याला प्रभळगड आणि तेथील परिसर दिसतो. आम्ही टाकीजवळ थोडा वेळ आराम करून, जेवून
निघालो. टाकी चा वाटेने म्हणजेच सुळक्याचा डाव्या वाटणे पुन्हा पाठी येऊन
आम्ही सुळक्याचा उजव्या बाजूला गेलो. सुळक्याला पूर्ण वळसा घालता येत
नाही. कारण पूर्ण रिंगण करायला वाट नाही आहे. त्यामुळे पुन्हा एका वाटेने
पाठी येऊन. दुसऱ्या बाजूला जायायला लागते.
सुळक्याचा उजव्या बाजूला, म्हणजेच दुसऱ्या बाजूला जुनी वास्तू किंवा पाण्याची टाकी, असे काहीच नाही. कातळात बसण्यासाठी
थोडीशी घसरती जागा आहे. पण ह्या बाजूने आपल्याला इर्शाळवाडी, मोरबे धरण,
तसेच माथेरानचा डोंगर आणि त्याचा भोवतालीचा परिसर दिसतो.
परतीचा प्रवास
सुळक्याचा
दोन्ही बाजू पाहून आम्ही २. ३० वाजता, आलो त्या वाटेने पुन्हा परतीचा
प्रवासाला लागलो. आम्ही ४ वाजता गडाचा पायथाचा गाव नानिवलीला पोहचलो.
तेथून आम्ही पुन्हा चालत बससाठी महामार्गाचा दिशेने चालू लागलो. पण दमट
वातावरण आणि उनामुळे प्रणव एकदमच थकून गेला होता. त्याला आम्ही रस्त्यात
दुचाकी वाहनावर पुढे पाठवून दिले. सुरज आणि मी दोघे चालत ४. ३० ला बस
स्थानकाजवळ पोहचलो. १५ ते २० मिनीटांनी पनवेल एसटी मिळाली. आम्ही ५. ३० वाजता पनवेलला पोहचलो. ह्या ट्रेक साठी आम्हाला प्रत्येकी १२५ रुपये खर्च आला. अशा प्रकारे आमचा इर्शाळगड झाला
https://youtu.be/Dsi67boEGOQ
![]() |
| इर्शाळ वाडीतून डावीकडे सोंडेच्या दिशेने गेलो असता. देवीचा मंदिर लागते. |
![]() |
| इर्शाळगडाचा सुळका हिथून दगडाच्या डाव्याबाजूने गडावर जाणारी वाट आहे. त्यामुळे दगडावर सरळ चढत जाऊ नये. त्यामुळे तुम्ही गडाचा वर पोहोचणार |
![]() |
| गडाचा कातळ चढताना लागणारी पहिली टाकी |
![]() |
| गडाच्या दुसऱ्या टोकाच्या माथ्यावरून दुसऱ्या शिखराच्या टोकाचा काढलेला फोटो. |
https://kunalstrek.blogspot.com/2017/11/
नमस्कार मंडळी
एक्सप्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईला जाताना अनेक गडकिल्ले दिसत राहतात.
पहिला टोलनाका पार केला कि डावीकडे धीर गंभीर लोहगड विसापूर उभे असतात तर
जरा दूरवर तुंग मान उंचावून बघत असतो.उजवीकडे राजमाचीच्या तुंगारली
धरणाजवळचे टॉवर दिसतात. खण्डाळ्याला नागफणी हात हलवून दाखवतो. घाट उतरून
खोपोलीला उतरल्यावर उजवीकडे भीमाशंकर आणि पदरगड सोबत करू लागतात तर दुरवर
डावीकडे कर्नाळ्याचा अंगठा थम्ब्स अप करून दाखवत असतो.जरा पुढे पनवेलजवळ
आले की प्रबळ आणि इर्शाळ स्मित करून स्वागताला सज्ज असतात.कळंबोलीहून पुढे
निघाले कि दूरवर हाजी मलंग तीन बोटे आणि करंगळी उंचावून आशीर्वाद देत असतो.
यापैकी बरेचसे किल्ले आतापर्यंत बघून झाले असले तरी प्रबळ आणि इर्शाळ मला
नेहमीच हुलकावणी देत आले आहेत. त्यापैकी इर्शाळचा बेत अचानक ठरला आणि बघता
बघता ८ -१० जण तयारही झाले.
वन डे ट्रेक असल्याने फार तयारी किंवा प्लॅनिंग न करता, पुणेकरांनी सरळ
ट्रेनने कर्जतला जायचे आणि मुंबईकरांनी त्यांना तिथेच भेटून पुढचा प्रवास
टमटम ने करायचं असा सोपा बेत ठरला.
मात्र ऐनवेळेला मरेने दगा दिला आणि डेक्कन क्वीन सोडून सर्व गाड्या रद्द
केल्या. त्यामुळे आयत्या वेळी बेत बदलावा लागला आणि पुणेकर 2 गाड्यांमधून
चौक फाट्याला येतील आणि मुंबईकर त्यांना तिथेच भेटतील असे ठरले.
यथासांग सर्वजण चौक फाट्याला भेटले आणि प्रथेप्रमाणे मिसळपाव चहा वगैरे होऊन मोरबे धरणाच्या
मार्गाला लागले (चौक फाट्यापासून 1 कि.मी. पुढे उजवीकडे छोटा रस्ता चौक रेल्वेस्टेशनला जातो. चौक गाव डावीकडे आहे तिकडे न जाणे ).
एकीकडे खेडेगावचे मोकळे वातावरण दिसू लागले. धरणाच्या भिंतीच्या कडेने गाड्या चालल्या होत्या.
आदिवासी पाडे दिसू लागले. एक दोन ठिकाणी थांबून रस्ता विचारला आणि एका
ठिकाणी रस्ता संपला तिकडे गाड्या लावून चढाईला सुरुवात केली. साधारण १०चा
सुमार होता पण ऊन तापत चालले होते. त्यामुळे पटापट पाय उचलू लागलो.
उजवीकडे मोरबे धरणाचा विशाल जलाशय सोबत करीत होता आणि त्यातील पाणी चमचमत होते.
दूरवर कर्जत पनवेल रेल्वे मार्ग दिसत होता आणि आगगाड्यांचे हॉर्न ऐकू
येत होते.क्वचित पक्ष्यांचे सुस्वर ऐकू येत होते.डावीकडे एक दोन छोटी धरणे
तलाव दिसत होते पण त्याकाठी बंगले असल्याने ते खाजगी तलाव आहेत कि काय असे
वाटत होते. याना सी.आर.झेड वगैरे कसे लागू होत नाहीत कोण जाणे?
असो. वाट चढणीची असल्याने आणि डोक्यावर सूर्य तळपत असल्याने चांगलीच
दमछाक होत होती आणि सारखे थांबून पाणी प्यावे लागत होते. तशातच एक
म्हातारबुवा उतरताना दिसले. आम्ही झाडाच्या सावलीत बसलो होतो. म्हातारबुवा
लंगडत आमच्याजवळ आले आणि आम्हाला विचारले " किल्ल्यावर चालला का?रस्ता
माहित आहे का तुम्हाला ?" माझे शहरी मन मला सांगू लागले कि आता हा वाट
दाखवतो म्हणणार आणि पैसे मागणार. म्हणून मी त्याला म्हटले कि आमचे लोक पुढे
गेलेत त्यांना वाट माहितेय. तरी तो म्हणाला कि डाव्या बाजूनेच जात राहा
..म्हणजे वाट चुकणार नाही. आणि वरती पाणी भरपूर आहे. काळजी करू नका.पुढे
त्याने पायाला बांधलेली चिंधी दाखवली आणि म्हणाला "कोयता लागला पायाला.खूप
रक्त गेले. आता चौक ला जाऊन इंजेक्शन आणि पट्टी करून येतो. पुन्हा माझे
शहरी मन सांगू लागले कि आता हा उपचारासाठी पैसे मागणार. पण त्याने तसे
काहीच केले नाही. त्याची मुलगी का सून पाठून येत होती . ती आली आणि हा
निघाला.
आता मात्र मलाच माझ्या विचारांची लाज वाटू लागली.शहरात येणाऱ्या एक एक
अनुभवांमुळे आपली विचार करायची पद्धत कशी बिघडून गेलेय आजकाल.असोच.
मध्ये एक आदिवासी पाडा लागला. ते म्हातारबुवा तिथूनच आले होते. इकडे नाचणी आणि तांदुळाची शेती खूप दिसली. नाचणी विकतही घेता आली.
पाडा सोडून पुढे निघालो.आता आम्ही इर्शाळ उजव्या हाताला ठेवून चाललो
होतो.इथून वर बघितले कि झोपलेल्या बुद्धाची पोझ दिसते असे म्हणतात.
ऊन तापत चालले होते. पण मधेच झाडी आली कि विसावा मिळत होता.पावसाळ्यातील गवतात अनेक किडे होते आणि अधे मध्ये चावून त्रासही देत होते.
एकीकडे आमचे फोटो ग्राफीचे प्रयोगही चालू होते. कुठे मधमाशीचा फोटो कधी, कुठे फुलाचा तर कुठे फुलपाखराचा.
नाहीतर पावलागणीक जवळ येत जाणारे इर्शालची शिखरे टीप असे चालेले
होते.ऍपर्चर,वाईड अँगल, 18 ठेवायचे 55, 5.6 कि 11, पर्स्पेक्टिव ,आय. एस.ओ
असे काय नी काय विषय बोलत बोलत आम्ही इर्शाळ च्या शिखराला येऊन भिडलो.
हायवेवरून दिसणाऱ्या दोन शिखरांपैकी हे उजवे शिखर. पण शिखरावर सरळ चढाई
करता येत नाही. त्यासाठी डाव्या बाजूने झाडीत घुसावे लागते. दुसरी लक्षात
ठेवायची गोष्ट म्हणजे इथे येण्याआधी एके ठिकाणी वाट चुकून खालच्या दिशेने
जाण्याचा संभव आहे. तेव्हा सतत वरती जाणारीच वाट घ्यावी.
(आम्हीपण चुकलो होतो पण वाटेतील एका झोपडीतील गोड आदिवासी मुलीने (बकुळा)
आम्हाला योग्य वाटेला आणून सोडले) अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे
इथवर मोरबे धरणाचे पाणी आपल्याला उजवीकडे दिसत राहते.ते दिसेनासे झाले तर
समजावे कि वाट चुकली.
तर आता आम्ही सुळक्याच्या डावीकडून झाडीत घुसलो आणि वर जायला सुरुवात
केली.शेवटची १०० मीटर चढाई राहिली असेल आणि एक पाण्याचे मधुर टाके लागले .
अहाहा ..सकाळपासून ज्याची वाट पाहत होतो ते शेवटी मिळाले.
सगळ्यांनी पोटभर पाणी पिऊन घेतले आणि हात पाय सुद्धा धुतले.सगळे एकदम फ्रेश झाले.
आता एक कठीण टप्पा आहे पण कोणी भल्या ग्रुप ने एक लाकडी शिडी इथे भक्कमपणे
अडकवली असल्याने सर्वजण तो टप्पा लीलया पार करून गेले आणि लवकरच वर
नेढ्यात पोचले.
हे नेढे इर्शालच्या दोन्ही शिखरांच्या मध्यभागी आहे. नेढ्यात ३-४ लोक बसू शकतात आणि आसपासही थोडी मोकळी जागा आहे. सावलीही होती
दुपारचा १ वाजला होता त्यामुळे सर्वांनी शिदोर्या सोडल्या आणि सहभोजन केले.पुन्हा फोटोग्राफीचे काही प्रयोग झाले.
त्यानंतर नेढ्यावर चढून मागच्या बाजूला लावलेल्या झेंड्याबरोबर फोटो वगैरे झाले.
इर्शालची दोन्ही शिखरे अजून शंभरेक मीटर वर होती.आणि आमच्याकडे रोप होता
पण आम्ही काही कसलेले गिर्यारोहक नाही.शिवाय उन्हाने खडक पार तापला होता.
त्यामुळे दर्शनमात्रें समाधान मानले आणि उतरायला लागलो.
ट्रेक मस्त झाला याचे समाधान मनात होते. पण काही जण त्यावर संतुष्ट नव्हते.
पनवेलच्या एका ग्रुपने काही वर्षांपुर्वी इर्शालच्या पोटात एक विवर शोधून
काढले होते ते त्यांना बघायचे होते.त्यामुळे शोधाशोध सुरु झाली. पाण्याच्या
टाक्या पर्यन्त खाली उतरलो आणि जरा उजवीकडे गेलो.थोड्या शोधानंतर वरच्या
दिशेला एका लैला मजनूचे नाव लिहिलेले दिसले आणि त्यावरून तिकडे जायला वाट
असावी असे कळले. मग काही उत्साही लोकांनी वाट शोधली आणि ५० फूट सोप्या चढाई
नंतर ते विवर मिळाले.
हे म्हणजे अक्षरश: "चेरी ऑन द केक" होते. ईर्शाळाच्या डाव्या शिखराच्या
पोटात हे आडवे विवर जवळ जवळ सत्तरेक फूट आतवर गेले आहे. ते कोणी आणि का
खोदले असावे माहित नाही पण ते वाऱ्या पावसाने तयार झालेले नाही एव्हढे
नक्की. आतमध्ये बघण्यासारखे काही नाही पण विझलेल्या शेकोटीवरून कोणीतरी ही
जागा मुक्कामाला वापरल्याचे समजले.
काळजीपूर्वक खाली उतरलो. 3 वाजत आले होते.त्यामुळे आता झपाझप पावले उचलली
आणि खाली उतरू लागलो. तासाभरात गाड्या लावलेल्या ठिकाणी पोचलो आणि पुढचा
ट्रेक कोणता करावा याचा खल करीत परतीच्या प्रवासाला लागलो.
टीप.. सर्व छायाचित्र माझा मित्र श्री. प्रवीण पाटील याच्या सौजन्याने
पनवेल - खोपोली मार्गावरुन जाताना दिसणारा हा ईरशाळ गड
ईरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण ईरशाळ हा एक सुळका आहे.टेहाळणीसाठी या ठिकाणाच उपयोग केला असेल.
उन्हाळा सुरु होण्या अगोदर हा ट्रेक करुन या सिझनची सांगता करण्याचे ठरल्याने या सिझनचा शेवटचा ट्रेक ईरशाळला करण्याचे ठरले. ईरशाळला जाण्यास वाहतुकीची सोय असल्याने सोपे पडते.
ईरशाळला जाण्यास दोन मार्ग आहेत.पनवेल - खोपोली मार्गावर किंवा कर्जत - पनवेल या मार्गावर बसने प्रवास करीत चौक रेल्वेस्टेशनच्या स्थानकावर (डाक बंगला) उतरावे.रेल्वे मार्ग ओलांडून चौक गावात येता.समोरच मोरबे घरणाची भिंत दिसते.त्या जलाशयाच्या बाजुला गडावर जाण्याची वाट दिसते.
उन्हाळा वाढल्याने खूपच गरम होत होते.घामाच्या घारा सुरु झाल्या.सावळीला थांबून दम खात पुढाचा टप्पा गाठायचो.बाजुने इरशाळवाडीतील माणसे जात येत होती.
गडाच्या पाठीमागून चढण्याची वाट आहे. समोरुन उन्हाचा तडाका होता.पाठीमागे गेल्यावर सावली ळाल्यावर चढाईला वेगे आला.पाण्याच टाक लागते.लगेच पुढे लाकडी शिडी लागते.तेथेच विशाळादेवीचे छोटेसे मंदीर आहे.दर्शन घेऊन पुढच्या चढाईला लागलो.आता परीक्षा घेणारी चढाई होती.
इरशाळ ला नेड्यापर्यत जाणे सोयीचे आहे. नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे.या ठीकाणी अपघात झालेले आहेत.
गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अत्सित्व पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते.
गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान,म्हैसमाळ, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.
कितीही त्रास झाला तरी सर्व मित्रांसह केलेला ट्रेक आंनददायीच असतो.त्याची मजा वेगळीच असते.
एक्सप्रेस हायवेवरून पुण्याहून मुंबईला जाताना अनेक गडकिल्ले दिसत राहतात. पहिला टोलनाका पार केला कि डावीकडे धीर गंभीर लोहगड विसापूर उभे असतात तर जरा दूरवर तुंग मान उंचावून बघत असतो.उजवीकडे राजमाचीच्या तुंगारली धरणाजवळचे टॉवर दिसतात. खण्डाळ्याला नागफणी हात हलवून दाखवतो. घाट उतरून खोपोलीला उतरल्यावर उजवीकडे भीमाशंकर आणि पदरगड सोबत करू लागतात तर दुरवर डावीकडे कर्नाळ्याचा अंगठा थम्ब्स अप करून दाखवत असतो.जरा पुढे पनवेलजवळ आले की प्रबळ आणि इर्शाळ स्मित करून स्वागताला सज्ज असतात.कळंबोलीहून पुढे निघाले कि दूरवर हाजी मलंग तीन बोटे आणि करंगळी उंचावून आशीर्वाद देत असतो.
यापैकी बरेचसे किल्ले आतापर्यंत बघून झाले असले तरी प्रबळ आणि इर्शाळ मला नेहमीच हुलकावणी देत आले आहेत. त्यापैकी इर्शाळचा बेत अचानक ठरला आणि बघता बघता ८ -१० जण तयारही झाले.
वन डे ट्रेक असल्याने फार तयारी किंवा प्लॅनिंग न करता, पुणेकरांनी सरळ ट्रेनने कर्जतला जायचे आणि मुंबईकरांनी त्यांना तिथेच भेटून पुढचा प्रवास टमटम ने करायचं असा सोपा बेत ठरला.
मात्र ऐनवेळेला मरेने दगा दिला आणि डेक्कन क्वीन सोडून सर्व गाड्या रद्द केल्या. त्यामुळे आयत्या वेळी बेत बदलावा लागला आणि पुणेकर 2 गाड्यांमधून चौक फाट्याला येतील आणि मुंबईकर त्यांना तिथेच भेटतील असे ठरले.
यथासांग सर्वजण चौक फाट्याला भेटले आणि प्रथेप्रमाणे मिसळपाव चहा वगैरे होऊन मोरबे धरणाच्या
मार्गाला लागले (चौक फाट्यापासून 1 कि.मी. पुढे उजवीकडे छोटा रस्ता चौक रेल्वेस्टेशनला जातो. चौक गाव डावीकडे आहे तिकडे न जाणे ).
एकीकडे खेडेगावचे मोकळे वातावरण दिसू लागले. धरणाच्या भिंतीच्या कडेने गाड्या चालल्या होत्या.
आदिवासी पाडे दिसू लागले. एक दोन ठिकाणी थांबून रस्ता विचारला आणि एका ठिकाणी रस्ता संपला तिकडे गाड्या लावून चढाईला सुरुवात केली. साधारण १०चा सुमार होता पण ऊन तापत चालले होते. त्यामुळे पटापट पाय उचलू लागलो.
उजवीकडे मोरबे धरणाचा विशाल जलाशय सोबत करीत होता आणि त्यातील पाणी चमचमत होते.
दूरवर कर्जत पनवेल रेल्वे मार्ग दिसत होता आणि आगगाड्यांचे हॉर्न ऐकू येत होते.क्वचित पक्ष्यांचे सुस्वर ऐकू येत होते.डावीकडे एक दोन छोटी धरणे तलाव दिसत होते पण त्याकाठी बंगले असल्याने ते खाजगी तलाव आहेत कि काय असे वाटत होते. याना सी.आर.झेड वगैरे कसे लागू होत नाहीत कोण जाणे?
असो. वाट चढणीची असल्याने आणि डोक्यावर सूर्य तळपत असल्याने चांगलीच दमछाक होत होती आणि सारखे थांबून पाणी प्यावे लागत होते. तशातच एक म्हातारबुवा उतरताना दिसले. आम्ही झाडाच्या सावलीत बसलो होतो. म्हातारबुवा लंगडत आमच्याजवळ आले आणि आम्हाला विचारले " किल्ल्यावर चालला का?रस्ता माहित आहे का तुम्हाला ?" माझे शहरी मन मला सांगू लागले कि आता हा वाट दाखवतो म्हणणार आणि पैसे मागणार. म्हणून मी त्याला म्हटले कि आमचे लोक पुढे गेलेत त्यांना वाट माहितेय. तरी तो म्हणाला कि डाव्या बाजूनेच जात राहा ..म्हणजे वाट चुकणार नाही. आणि वरती पाणी भरपूर आहे. काळजी करू नका.पुढे त्याने पायाला बांधलेली चिंधी दाखवली आणि म्हणाला "कोयता लागला पायाला.खूप रक्त गेले. आता चौक ला जाऊन इंजेक्शन आणि पट्टी करून येतो. पुन्हा माझे शहरी मन सांगू लागले कि आता हा उपचारासाठी पैसे मागणार. पण त्याने तसे काहीच केले नाही. त्याची मुलगी का सून पाठून येत होती . ती आली आणि हा निघाला.
आता मात्र मलाच माझ्या विचारांची लाज वाटू लागली.शहरात येणाऱ्या एक एक अनुभवांमुळे आपली विचार करायची पद्धत कशी बिघडून गेलेय आजकाल.असोच.
मध्ये एक आदिवासी पाडा लागला. ते म्हातारबुवा तिथूनच आले होते. इकडे नाचणी आणि तांदुळाची शेती खूप दिसली. नाचणी विकतही घेता आली.
पाडा सोडून पुढे निघालो.आता आम्ही इर्शाळ उजव्या हाताला ठेवून चाललो होतो.इथून वर बघितले कि झोपलेल्या बुद्धाची पोझ दिसते असे म्हणतात.
ऊन तापत चालले होते. पण मधेच झाडी आली कि विसावा मिळत होता.पावसाळ्यातील गवतात अनेक किडे होते आणि अधे मध्ये चावून त्रासही देत होते.
एकीकडे आमचे फोटो ग्राफीचे प्रयोगही चालू होते. कुठे मधमाशीचा फोटो कधी, कुठे फुलाचा तर कुठे फुलपाखराचा.
नाहीतर पावलागणीक जवळ येत जाणारे इर्शालची शिखरे टीप असे चालेले होते.ऍपर्चर,वाईड अँगल, 18 ठेवायचे 55, 5.6 कि 11, पर्स्पेक्टिव ,आय. एस.ओ असे काय नी काय विषय बोलत बोलत आम्ही इर्शाळ च्या शिखराला येऊन भिडलो.
हायवेवरून दिसणाऱ्या दोन शिखरांपैकी हे उजवे शिखर. पण शिखरावर सरळ चढाई करता येत नाही. त्यासाठी डाव्या बाजूने झाडीत घुसावे लागते. दुसरी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथे येण्याआधी एके ठिकाणी वाट चुकून खालच्या दिशेने जाण्याचा संभव आहे. तेव्हा सतत वरती जाणारीच वाट घ्यावी.
(आम्हीपण चुकलो होतो पण वाटेतील एका झोपडीतील गोड आदिवासी मुलीने (बकुळा) आम्हाला योग्य वाटेला आणून सोडले) अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इथवर मोरबे धरणाचे पाणी आपल्याला उजवीकडे दिसत राहते.ते दिसेनासे झाले तर समजावे कि वाट चुकली.
तर आता आम्ही सुळक्याच्या डावीकडून झाडीत घुसलो आणि वर जायला सुरुवात केली.शेवटची १०० मीटर चढाई राहिली असेल आणि एक पाण्याचे मधुर टाके लागले . अहाहा ..सकाळपासून ज्याची वाट पाहत होतो ते शेवटी मिळाले.
सगळ्यांनी पोटभर पाणी पिऊन घेतले आणि हात पाय सुद्धा धुतले.सगळे एकदम फ्रेश झाले.
आता एक कठीण टप्पा आहे पण कोणी भल्या ग्रुप ने एक लाकडी शिडी इथे भक्कमपणे अडकवली असल्याने सर्वजण तो टप्पा लीलया पार करून गेले आणि लवकरच वर नेढ्यात पोचले.
हे नेढे इर्शालच्या दोन्ही शिखरांच्या मध्यभागी आहे. नेढ्यात ३-४ लोक बसू शकतात आणि आसपासही थोडी मोकळी जागा आहे. सावलीही होती
दुपारचा १ वाजला होता त्यामुळे सर्वांनी शिदोर्या सोडल्या आणि सहभोजन केले.पुन्हा फोटोग्राफीचे काही प्रयोग झाले.
त्यानंतर नेढ्यावर चढून मागच्या बाजूला लावलेल्या झेंड्याबरोबर फोटो वगैरे झाले.
इर्शालची दोन्ही शिखरे अजून शंभरेक मीटर वर होती.आणि आमच्याकडे रोप होता पण आम्ही काही कसलेले गिर्यारोहक नाही.शिवाय उन्हाने खडक पार तापला होता. त्यामुळे दर्शनमात्रें समाधान मानले आणि उतरायला लागलो.
ट्रेक मस्त झाला याचे समाधान मनात होते. पण काही जण त्यावर संतुष्ट नव्हते. पनवेलच्या एका ग्रुपने काही वर्षांपुर्वी इर्शालच्या पोटात एक विवर शोधून काढले होते ते त्यांना बघायचे होते.त्यामुळे शोधाशोध सुरु झाली. पाण्याच्या टाक्या पर्यन्त खाली उतरलो आणि जरा उजवीकडे गेलो.थोड्या शोधानंतर वरच्या दिशेला एका लैला मजनूचे नाव लिहिलेले दिसले आणि त्यावरून तिकडे जायला वाट असावी असे कळले. मग काही उत्साही लोकांनी वाट शोधली आणि ५० फूट सोप्या चढाई नंतर ते विवर मिळाले.
हे म्हणजे अक्षरश: "चेरी ऑन द केक" होते. ईर्शाळाच्या डाव्या शिखराच्या पोटात हे आडवे विवर जवळ जवळ सत्तरेक फूट आतवर गेले आहे. ते कोणी आणि का खोदले असावे माहित नाही पण ते वाऱ्या पावसाने तयार झालेले नाही एव्हढे नक्की. आतमध्ये बघण्यासारखे काही नाही पण विझलेल्या शेकोटीवरून कोणीतरी ही जागा मुक्कामाला वापरल्याचे समजले.
काळजीपूर्वक खाली उतरलो. 3 वाजत आले होते.त्यामुळे आता झपाझप पावले उचलली आणि खाली उतरू लागलो. तासाभरात गाड्या लावलेल्या ठिकाणी पोचलो आणि पुढचा ट्रेक कोणता करावा याचा खल करीत परतीच्या प्रवासाला लागलो.
टीप.. सर्व छायाचित्र माझा मित्र श्री. प्रवीण पाटील याच्या सौजन्याने
हाच तो ईर्शाळा !!
दोन ::: दुसर्यांदा गेलो तेव्हा सुळका सर करायचाच असे ठरविले होते.पण
घसरुन ५० फुट खाली पडलो.डाव्या तळपायाला ७ टाके पडले आणी उजव्या पायाच्या
गुडघा सटकला.पण त्यावेळी दिड-दिवस ठाकरवाडीत ज्या तर्हेने माझा ईलाज केला
त्या बद्द्ल मी त्या ठाकरवाडीच शतशः ऋणी आहे.शिवाय त्यांनी जे मला
बांबुच्या कामठ्याला सतंरजी गुंडाळुन खोपोलीच्या सरकारी ईस्पितळापर्यंत
आणले ते उपकार वेगळेच !!
हिच ती २५ एक घरांची ठाकर वस्ती .
तीन ::चार वर्षांनी पुन्हा एकदा जायचा योग आला. का आला ह्या करता एक
वेगळा भाग लिहावा लागेल, पण ह्या वेळी पण परत येताना मात्र आयुष्यभर आठवणीत
राहील असा दिवस घेउन आलो.
प्रवास सुरु होते तो ईथे ...जाताना नेहमी प्रमाणे दर्शन....प्रती शिर्डी...शिरसगाव.
आणी मग एक स्टॉप उदरभरणासाठी...पनवेल फाट्याच्या अलीकडे..
मिसळ महत्त्वाची नाही पण अश्या चटण्यांनी नाष्टार्जनाला रंगत आणली..
प्रवासाची सुरुवात होते ती ईथुन..पनवेल खोपोली रोडवर एक १७-१८ कि.मीवर
धरणाचा फाटा फुटला की डाव्या बाजुला डांबरी रस्ता संपेपर्यंत जायच आणी
पहिले धरण परिसर न्याहाळायचा. शेजारीच १५ एक घरांची कातकरी वस्ती..
ह्या सदगृहस्थाचा फोटो ईथे देण्याचा मोह आवरत नाहीये...एका एम-८० वर एका
आख्ख्या संसाराला पुरतील ईतकी भांडी घेउन हिंडायच...स्वताच दुकान
टाकण्याईतपत ऐपत नाही..खोपोलीतुन गाडीवर अडकावयची आणी मारवाड्याला गल्ला
आणुन द्यायचा...वरच कमीशन आणी पेट्रोल वर मात्र ह्याचा स्वताचा संसार....
वस्ती सोडली की जंगलात शिरायच..
जे वरतुन असे दिसते..
जाताना प्रदीपदादांनी एक डिंक-भुंगा पकडला..
सुरुवातीला उजवा डोंगर आणी मग डावा....पण फोटोकडे जरा व्यवस्थित
बघा...माझ्याकडे नाही त्या डाव्या बाजुला सुळक्याकडे एखादी मानवी
चेहर्याची प्रतिमा दिसतेय का ? हे ईर्शाळ्याला आहे,होय .एक चेहरा तर थेट
हनुमानाच्या चेहर्यासारखा दिसतो...तो सुळका कुठुनही बघा...दिसतो म्हणजे
दिसतोच
दुसरी ही पायवाट संपली
डोंगर चढायला सुरुवात केली आणी हळु-हळु धरण छोटे होत गेले..
वरुन दिसणारे सृष्टी-सौंदर्य..
डोगंरमाची पर्यंत पोहोचे पर्यंत छातीचा भाता झाला होता..आणी पायवाट ही नीटशी दिसत नव्हती पण ईर्शाळा मात्र एकदम स्पष्ट...
आणी ठाकर वस्तीला वळसा घालुन सुळक्याकडे निघालो...वरच्या चित्रात एक कातळाला पडलेल नेढं लक्षात ठेवा..त्यात पंधराजण तरी बसु शकतात..
टेकाडाला रिंगण घालुन सुळक्यापर्यंत जात येत .एखादा ९ नंबरचा शुज आडवा केला की जितकी जागा होईल तितक्याच जागेईतकी पायवाट ...
ईथवर रस्ता संपतो आणी चढाईला सुरुवात होते..
आणी शेवटी शिडी सापडली ...
आणी पाणी ही....ईथे आणी वरच्या सुळक्यावर दोन टाक्या आहेत . ..वरती
साचलेले शेवाळ नाही...कसलीतरी पानं आहे ..हे पाणी ईथे १२ महिने असते...आणी
पिण्याजोगते,,
टाकीशेजारी असलेल औदुबंराच झाड्...आणी लांबवर जो दुसरा सुळका दिसतोय तो कर्नाळा..
योगेशने मंदीराची साफसफाई केली ..त्याचा जो पाय खाली गेलाय ..तिथुनच मी खाली पडलो होतो...पावसामुळे निसरड झालत.
ईथुन साधारण १५-२० फुट वर सरळ चढ्ण आहे..पण एकावेळेस एकजण जाउ शकतो..आणी
पहिला वर गेला की त्याने दुसर्याला आवाज द्यायचा..त्यामुळे फोटोज नाही
काढता आले ..पण वर ..हेच ते नेढं
ही वरची टाकी..एखाद्या ईंटेरियर डिझायनरने बनवावी तशी...एक वर्तुळाकार
टाकीच्या मधोमध खांब बसविला...मागच्या कातळाला नेढं आहे नेढातुन
सुर्यप्रकाश थेट टाकीच्या पाण्यात शेजारी औंदुबराच झाड्..पण एकावेळेस एक
माणुस थांबु शकेल ईतकीच शेजारी जागा..
नावं बघुन गडबडु नका...ठाकर गड्याच लग्न झाल की ठाकर गडी,गडणी आणी पुर्ण
परिवाराला ईथे ह्या जागी याव लागत्..सासु सासर्यासकट्...पुर्वीच्या काळी
ईथे काहीतरी दगडाने कोरायचे ..पण आता सुशिक्षीत झाल्याने नावे टाकतात ..ईथे
पाच माणसांच्या वर लोक उभे राहु शकत नाही...पण प्रदीपदादानी सांगीतले की
ईथे एक आख्खा उत्सव होतो...मला विश्वास बसला नाही..पण प्रदीपदादा मात्र ठाम
होता...
शेवटी खाली आलो...संध्याकाळी प्रदीपदादाकडे जेवलो..अॅन्ड रिटर्न टु पुणे..
हे असेच काहीसे..
एक ठाकर आणी ठाकर वाडीतील घरे.
एक ठाकर आणी प्रबळगड
ही कातकर्यांची वस्ती
पावसानंतर लगेच जर एखादा ऑफबीट ट्रेक करून निसर्ग अनुभवायचा असेल तर, 'इर्शाळ'ला विसरून चालणार नाही. अगदी मुंबई-ठाण्यापासून जवळच आणि एका दिवसात करण्यासारखा. झालंही तसंच, ठरवलेला इर्शाळ पावसामुळं स्थगित झाला आणि कोथळीगड केला. कोथळीगडानं आम्हाला भन्नाट अनुभव दिला. दिवाळी समोर असताना त्यानंतर लगेच 'इर्शाळ' करणं शक्यही नव्हतं. मनात हुरहूर होतीच.
तसं पाहिलं तर मागील वर्षी याच दिवसात केलेला पेबचा विकटगड, प्रबळगड, आम्ही अनेकदा गेलेलो कर्नाळा आणि आत्ताचा 'इर्शाळ' हे सगळे सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेत येणारे. अति कठीण नसले तरी धोकादायक. चढाईच्या बाबतीत सोपे नसले तरी दमवणारे आहेत. या सर्वांचा एक गुणधर्म म्हणजे अरुंद, तीव्र उतारावर पायाखालची घसरणारी इथली माती. एकदा घसरलो की खालच्या एक दोघांना घेऊनच खाली जाणाऱ्या इथल्या वाटा.. पेबच्या विकटगडला तर परतीच्या वेळी अंधारातून ढोरवाटाही तुडविल्यात..
सह्याद्रीत अनेक उंच डोंगर, गड किल्ले आहेत. ऑफबीटही आहेत. पण खुमखुमी जिरवायची असेल तर माथेरानच्या रांगेतले दोन-तीन करावेच..
योग जुळून आला आणि दिवाळीच्या आदल्या रविवारी निघालो. भल्या सकाळी खायचं बांधून घेऊन घर सोडलं.
'इर्शाळ' तसा पनवेलच्या राहत्या घरापासून जवळच 25 किलोमीटरवर म्हणता येईल. चौकच्या अलीकडे डाव्या बाजुला एखाद्या मैलावर., मुंबई पुणे हायवेवरून त्याच्या विशिष्ट आकारामुळं नजरेत येतो. तर पुण्याहून येताना खालापूर टोलनाका सोडल्यावर 'चौक' नंतर उजवीकडे.. शरीरसौष्ठव स्पर्धेत मूठ वळावी, त्या मुठीच्या आकाराचा, सह्याद्रीतील 3700 फूट उंचीचा बेलाग उघडा कातळ. अगदी रस्त्याकडेला म्हणता येईल.
याचं सौंदर्य बघायचंय त्यांनी पावसानंतर लगेच जावं. एकदा का ऊन्ह तापली की डोंगर ऊतारावरची फुलं लुप्त होतात.
चौक रेल्वे स्थानक सोडून उजवीकडे मोर्बे जलाशयाकडे जाणारा रस्ता थेट इर्शाळगडाला घेऊन जातो. स्वतःचं वाहन असेल तर 'नानिवली' गावापर्यंत जाता येतं किंवा 'वडाप' आहेच.
आम्ही सकाळी नऊ वाजता नानिवलीपासून पायवाटेनं चढाई सुरु केली. सुरुवातच मुळी तीव्र चढानं सुरू झाली. हा चढ खुप दमछाक करतो. एक संपला की दुसरा, असा टप्प्या टप्प्यानं दमवतो. एक दोनदा बसायला लावून पाणी पाजतोच..
तीव्र चढाईचे टप्पे
हा चढ संपला की मागे वळून पाहिल्यास मोर्बे धरणाच्या जलाशयाचा परिसर खूप सुंदर दिसतो. नजरेच्या पूर्ण टप्प्यात येतो.
मोर्बे जलाशय (Morbe Reservoir)
Morbe Reservoir & catchment Area
इथपर्यंत डोंगर उघडा आणि रखरखीत निष्पर्ण आहे. पुढच्या पाऊलवाटेची चढाई थोडी कमी होत जाऊन, अधून मधून सावली देणारी झाडं आहेत. तर मधेच ही वाट डोंगराच्या उंच कडेवर घेऊन जाऊन, कमरेइतक्या गवतातून सरळ पठारावर आणून सोडते. या पठारावरून इर्शाळगडाचं क्षणिक दर्शन होतं. पुढे चालत राहिल्यास तास दिड तासात इर्शाळवाडी दिसू लागते.
इर्शाळवाडी हे गडाच्या पायथ्याचं छोटं आदिवासी गांव. शहरापासून जवळ असूनही मागासलेले. गावात सुखसुविधा आजून पोहचायच्या आहेत. इथं भातशेती मात्र विपुल करतात. गावचे तरुण दिवसभर क्रिकेटच्या मॅच मध्ये रंगलेले दिसतात. असो..
इर्शाळवाडीतुन दिसणारा गड उजवीकडे ठेवून, वाट गडाला वळसा मारण्यासाठी डावीकडून पुढे जाते. गाव सोडताच, गावाबाहेर पाऊल वाटेवरच्या उतारावर गडाची अधिष्ठाती 'श्री विशाळा' देवीचं छोटं देऊळ आहे. विशाळा देवीच्या नावावरून गडाला "इर्शाळगड" नांव पडलं असावं.
श्री विशाळा देवी
ही वाट पुढे गडाच्या डाव्या बाजूनं चढाची तीव्र वळणं घेत एका सपाटीवर पोहोचते आणि या इर्शाळ माचीवरून समोर इर्शाळचा महाकाय सुळका नजरेत येतो.
इर्शाळ माचीवरून
पठारावरून पुढे सुळक्याकडे जाऊन वाट पुन्हा डावीकडे जाते ते थेट गडाच्या मागच्या बाजूला पोहचतो. सुरवातीला इर्शाळवाडीतून गड समोरच दिसतो पण जाण्याची पाऊलवाट व गडचढाई मात्र मागून, फिरूनच करावी लागते.
पुढे नजरेसमोर प्रचंड दरीपलीकडचा प्रबळगड ठेवून वाट थोडी उतार होत इर्शाळच्या कातळाला समतल जाते. इथे एक भला मोठा तुकडा या कातळपासून सुटून डोंगरा लगतच उतारावर स्थिरावला आहे. या दोन्हींच्या मधून जेमतेम एखादी व्यक्ती अंग चोरून पलिकडं सरकेल इतकी चिंचोळी वाट उरली आहे.निखळलेला आणि जिथून निखळला त्या कातळाच्या पृष्ठभागावर निळसर हिरवा रंग दिसतो. अशाच नैसर्गिक टिकाऊ रंगांचं मिश्रण ई. स. पूर्व दुसऱ्या शतकातील औरंगाबाद येथील अजिंठ्यासारख्या लेण्यातील चित्रे रंगवण्यासाठी वापरलं असावं.
कातळामधील चिंचोळी वाट
खंडकांवरील रंग
वाट पुढे उजवीकडे वळून, मोठमोठ्या दगडातून अवघड टप्पे चढत कातळावर जाते. उजवीकडे वळण्याआधी आपण पुढे सरळ गुहेत जावू शकतो, पण गुहेची वाट जीवावर बेतणारी असल्यानं ती अलीकडेच बंद केली आहे. कातळावर चढाई करण्यापूर्वी उजवीकडं उतारावर एक पाण्याची टाकी कोरली आहे. त्यात पावसाचं पाणी जमा होतं. गडावरुन टेहाळणी करणाऱ्यास त्या पाण्याचा उपयोग होत असावा.
पाण्याची कोरलेली टाकी
पुढे कातळाच्या तीव्र उतारावर चार पायंड्यांची शिडी बसवली आहे. ती सांभाळून चढल्यावर आणखी एक कठीण आणि धोकादायक उभा चढ आहे. इथेही एक डळमळणारी,अरुंद आणि अर्धवट उंचीची शिडी बसवली आहे. शिडीच्या टोकावरून पुढचा कातळ अतिशय सावध, तोल सांभाळत एक एक करून चढावं लागतं. शिडीच्या पायंड्या दोरीनं बांधल्या असून त्या वरखाली, तिरकस झाल्या आहेत. शिडी अरुंद आणि कातळालगत खाचेत अडकवल्यानं, चढता उतरताना तोल पूर्ण बाहेरील बाजूस दरीकडे राहतो. अगदी थोडीशी घाई किंवा या उंचीमुळं क्षणभर संयम सुटल्यास जीवावर बेतू शकतं. बरेच नवखे या शिडीपासून माघारी फिरताना दिसतात.
सह्याद्रीत विशेषतः ऑफबीट ट्रेकला शेवटी शेवटी असे अवघड आणि धोकादायक टप्पे नक्कीच अनुभवायला येतील.
शनिवार-रविवारी मात्र या शिडीजवळ भगव्या कफनीत एक म्हातारा उभा असतो. शिडी तीच आहे, फक्त तो खाली उभा राहून चढणाऱ्या, उतरणाऱ्यांना तोंडी मानसिक धीर देत असतो. गड चढून उतरल्यावर आपण त्याला जे प्रेमानं देऊ, ते तो घेतो. कधीकाळी अचानक अडचण उद्भवल्यास खाली इर्शाळवाडीत मदतीसाठी त्याच्यामार्फत वर्दी देऊ शकतो. इतर दिवशी तो तिथं असेलच याची खात्री देता येत नाही.
दोन्ही शिडींच्या मध्ये उतारावर असताना, आधीच वर गेलेला 'मुसाफिर' ग्रुप उतरू लागला आणि आम्हाला त्या अवघड जागी अर्धा तास अवघडून उभं राहावं लागलं. त्याच वेळी खालून अंधेरीचे 'टीम किल्लेदार' ट्रेकर्स आले आणि त्या धोकादायक, अपुऱ्या जागेत गर्दी झाली. एखाद्याची थोडीशी चूकही इतरांना भोवते तसं आमच्यासाठी ते धोकादायकच होतं, पण इलाज नव्हता.
'टीम किल्लेदार' खाली असल्यानं आम्हाला वर चढाई करण्यास त्यांची मदत झालीच.
शिडीचे टप्पे
दोन्ही टप्पे वर चढुन आलो की आपण सरळ नेढ्यात पोहोचतो. हे नेढं म्हणजे डोंगराच्या कातळाला नैसर्गिक रीतीनं पडलेलं छिद्र.. सह्याद्रीत अशी बरीच नेढी आहेत.
येणाऱ्या वाटेकडं पाठ करून या नेढ्यात उभं राहिलं की खाली इर्शाळवाडी दिसते. समोर मोर्बे धरणाचा जलाशय अगदी लहान वाटू लगतो, आणि त्या समोरील विस्तृत परिसर नजरेसमोर येतो. उजव्या हाताला दूरवर धुक्यात कर्नाळा दिसतो. वातावरण नितळ असेल तर तो कॅमेऱ्यातही घेता येईल.
तर मागे प्रचंड दरीपलीकडचा प्रबळगड नजरेत आणखीनच 'प्रबळ' दिसतो. प्रबळ च्या मागेच माथेरान डोंगर, बेलाग चंदेरी आणि दूरवर मलंगगड असा सारा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो.
नेढयातून दिसणारा उजेड
गड माथ्यावरील नेढं
गड माथ्यावरील नेढं
इथं वाऱ्याचा मारा इतका आहे की नेढ्यात जपूनच उभं राहावं लागतं. इथला घोंगावणारा वारा आम्ही रायगड, लोहगडलाही अनुभवला नाही. मध्ये कुठलीच आडकाठी नसलेल्या मोर्बे जलशयावरून, पाण्याचा गारवा घेऊन थेट इर्शाळला भिडतो. कॅमेऱ्यात व्हिडीओ घेताना त्याचा रुद्र आवाज अनुभवता येतो.
या वाऱ्याच्या माऱ्यामुळंच झीज होऊन या अजश्र कातळाचे छोटे मोठे भाग निखळत असावेत. हे नेढं आणि आधी उल्लेख केलेला वाटेवरचा मोठा कातळ असाच निखळला असावा. आम्ही इथं हा अवघड टप्पा चढुन नेढ्यात येण्यापूर्वी असाच एक वर खडकाचा छोटा तुकडा निखळून वेगानं खाली आला आणि 'टीम किल्लेदार' मधील एकाच्या उजव्या हाताला चाटून गेला. जखम झालीच पण थोडक्यात निभावलं. त्यावेळी आम्ही तिथंच होतो.
खाली टीम किल्लेदारचा जखमी ट्रेकर
नेढं ओलांडुन वाट डाव्या बाजूला एक छोटा पण सोपा कातळ चढून नेढ्यावरील सपाटीवर येते आणि सरळ आकाशाला गवसणी घालणाऱ्या सुळक्याच्या पायाशी येऊन संपते. वर कातळालगतच कोरलेली पाण्याची टाकी आहे. सुळक्यावर चढाई करण्यासाठी मात्र दोर आणि प्रस्तरारोहण (रॅपलिंग ची) कला आणि त्या साहित्याची गरज आहे.
कोरलेल्या पाण्याच्या टाकीवरून इर्शाळगडचा टेहळणीसाठी उपयोग केला जात असावा. इतिहासात 'इर्शाळ'चा विशेष उल्लेख नाही. पण 1666 च्या मे मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी आणि रायरी पर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला. त्यावेळी इर्शाळगड स्वराज्यात सामील झाला.
गडपायथ्याला असलेलं 'चौक' हे राजा शिवछत्रपतींचे निकटवर्ती आणि शत्रूच्या उरात धडकी भरवणारे, स्वराज्याचे पहिले सरसेनापती नेतोजी पालकर यांचं जन्मगांव आहे. आणि महाराजांची तीसरी पत्नी, पुतळा राणीसाहेब याच पालकर घराण्यातील होत..
https://sahyadri300.blogspot.com/2020/11/


































No comments:
Post a Comment