नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हे तालुक्याचे गाव मध्ययुगात यादव घराण्याची पहिली राजधानी होती . सिन्नरचे सुंदर कलाकुसर असलेले गोंदेश्वर मंदिर , एकतेश्वर मंदिर या परिसरात असलेले किल्ले एकेकाळच्या या ऐश्वर्यसंपन्न राजधानीची साक्ष देत उभे आहेत. कुठलेही राज्य सुरळीत चालण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो महसूल . शेतीशी तुलना करता व्यापार हे महसूल मिळविण्याचे सर्वात विश्वासार्ह साधन आहे . त्यामुळे सर्व राजांनी व्यापाराला बळकटी देण्यासाठी बंदरे तयार केली , बाजारपेठा वसवल्या . या बंदरे , बाजारपेठा , राजधानी यांना जोडणारे व्यापारी मार्ग तयार केले . या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागेवर किल्ले बांधले . सिन्नर - अकोले या राजधानी आणि बाजारपेठेला जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर सोनगड आणि पर्वतगड हे दोन जोड किल्ले आजही उभे आहेत. इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासात त्याची नोंद नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशाच अनेक गडापैकी एक गड किल्ले सोनगड. पर्वतगड आणि सोनगड हे जोडकिल्ले असुन एका खिंडीने वेगळे झाले आहेत. यातील सोनगड हा चिंचोळा माथा असणारा लहान आकाराचा किल्ला तर पर्वतगड हा मोठया विस्ताराचा किल्ला आहे. एक दिवसाच्या भेटीत हे दोनही किल्ले सहजपणे पाहुन होतात. नाशिकहून फक्त ५०कि.मी. तर सिन्नरहुन दापूरमार्गे केवळ २६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गडाकडे गिरीमित्रांचे पाय फार क्वचीतच वळतात. सतत उपेक्षित राहिलेल्या या गडांची माहिती सहजतेने सापडतही नाही.
गडांचा नेमका इतिहास आपल्याला ठावूक नाही.मात्र सोनगडावर असणार्या कातळकोरीव टाक्याचा विचार करता हा गड निश्चितच प्राचीन आहे. इ.स. १६७० नंतर या परिसरातील डुबेरगड, पट्टा आणि आड हे गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते.कदाचित सोनगड आणि पर्वतगड हे सुध्दा स्वराज्यात सेवेत असतील. चित्रगुप्ताच्या बखरीत सोनगड आणि पर्वतगड याची नावे येतात.
 |
| डावीकडचा सोनगड आणि उजवीकडे पर्वतगड |
सोनगड आणि पर्वतगड या किल्ल्याच्या पायथ्याशी सोनेवाडी हे गाव आहे .भोजापुर धरणाच्या काठावर हे वसलेल बर्यापैकी सधन गाव आहे .गावात काही जुन्या बांधणीची घर आणि वाडे उध्वस्त अवस्थेत आहेत.
 |
| पडका वाडा , सोनेवाडी |
सोनेवाडी गावात पोहोचण्यासाठी मुंबईहून घोटी मार्गे सिन्नर गाठावे. सिन्नर - पुणे रस्त्यावर सिन्नरहून १० किमी अंतरावर गोदेवाडी फाटा आहे . हा रस्ता थेट अकोलेला जातो. या रस्त्यावर गोंदेवाडी - दापूर - चापडगाव - सोनेवाडी हे अंतर १६ किमी आहे . सोनेवाडी ते अकोले १७ किमी, सोनेवाडी ते सिन्नर २३ किमी आणि सोनेवाडी ते नाशिक ५३ किमी अंतर आहे . सिन्नर आणि अकोलेहून दर तासाला सोनेवाडीला जाण्यासाठी एस टी बसची सोय आहे . सिन्नर आणि गोदेवाडीहून सोनेवाडीसाठी जीप्स आहेत .सोनगड हा किल्ला भोजापुर गावांच्या मागे डोंगरावर उभा आहे. सिन्नरपासुन २५ कि.मी.अंतरावर भोजापुर गाव आहे.
सोनेवाडीतून दोन मार्गाने सोनगडावर जाता येते .
१) खिंडीतला मार्ग :- सोनगड आणि पर्वतगडाच्या मध्ये एक खिंड आहे . या खिंडीत जाण्यासाठी सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळ उतरावे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. याठिकाणी टेकडीवर काही घरे आहेत त्यामुळे टेकडीवर चढायला पायऱ्या आहेत. या पायऱ्यानी आपण ५ मिनिटात टेकडीवर पोहोचतो. टेकडीवरुन समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठाराच्या उजव्या बाजूला गावाच्या मागेच असलेला डोंगर म्हणजे पर्वतगड दिसतो, तर पठाराच्या डाव्या बाजूला कातळटोपी असलेला डोंगर म्हणजेच सोनगड दिसतो. या दोन्ही किल्ल्यावर जाणारी वाट या दोन डोंगरान्मधील खिंडीतून जाते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात. पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीकडे जातांना वाटेत वनखात्याने पाणी अडवण्या जिरवण्यासाठी जागोजागी चर खोदलेले आहेत. पठारावरून किल्ल्यावर पोहोचायला १५ मिनिटे लागतात. किल्ल्याचा डोंगर पूर्व पश्चिम पसरलेला आहे. त्यावर पश्चिमेस कातळ टोपी आहे. त्यामुळे दुरुन हा डोंगर शंकराच्या पिंडीसारखा दिसतो . या डोंगरावर अर्ध्या उंची पर्यंत वनखात्याने झाडे लावलेली आहेत. त्या झाडीतून तिरके तिरके चढत गेल्यावर साधारणपणे १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगराच्या पूर्व टोकाकडे पोहोचतो. इथून एक डोंगरधार खाली उतरत रस्त्यापर्यंत जाते. या डोंगरधारे वरुनही किल्ल्यावर चढून येता येते.
२) पूर्व डोंगरधारे वरुन :- सोनगड किल्ल्याची एक डोंगरधार पूर्वेकडे उतरलेली आहे . सोनेवाडी गावाच्या पुढे अकोलेच्या दिशेने दोन किलोमीटर पु गेल्यावर रस्त्या लगत उजव्या बाजूला एक शाळा आणि त्यामागे दर्गा आहे . या दर्ग्यापासून पायवाट पूर्व डोंगरधारेवरुन किल्ल्यावर जाते .भोजापुरच्या पुढे ३ कि.मीवर कासारवाडी गाव आहे. या दोनही गावातुन सोनगडावर एका तासात जाता येते. भोजापुर गावातून कासारवाडी गावाकडे जाताना कासारवाडी फाटा येण्यापुर्वी वाटेत एक हनुमान मंदीर आहे. या मंदिरासमोरून उजव्या हाताला जाणारा रस्ता सोनगडाकडे जातो. हा रस्ता खुपच खराब असल्याने गाडी वाटेतील दर्गा अथवा शाळेकडेच ठेवावी व शाळेतील नळावरून पिण्याचे पाणी भरून घ्यावे. गडावर पाण्याची तीन टाकी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. येथुन समोरच माथ्यावर खंडोबाचे देऊळ असणारा छोटा सोनगड दिसतो. गाडी ठेवुन दर्ग्याच्या बाजूने जाणाऱ्या वाटेने सोनगड समोर ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण सोनगडच्या सुळक्याच्या खालील पठारावर येतो.
 |
सोनगडचा कातळटप्पा
|
या पठारावर आपल्याला उध्वस्त घरांचे चौथरे दिसुन येतात. यातील एका चौथऱ्यावर एक शिवपिंडी व तिच्यालगत नंदी ठेवला आहे. या पठारावरून उजव्या बाजूची वाट पर्वतगडला जाते तर सरळ जाणारी वाट सोनगडवर जाते. या पठारावरून अर्ध्या तासात गडाच्या माथ्यावर जाता येते. सोनेवाडी गावातून खिंडीतून येणारी वाट येथेच येते .
सोनगड आणि पर्वतगड दोन्ही करण्यासाठी साधारण ५ तास लागतात.किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही . गावातील शाळेच्या व्हरांड्यात रहाण्याची सोय होते .जेवणाची सोय गावात नाही .हे दोन्ही गड बघण्यासाठी योग्य कालावधी म्हणजे जुन ते फ़ेब्रुवारी. चिंचोळ्या माथ्याचा हा गड पुर्व-पश्चिम पसरलेला असुन गडाची पायथ्यापासुन उंची १००० फुट ( समुद्र सपाटीपासून ८५० मीटर, २७९० फुट ) आहे. गडाची लांबी रुंदी ४०० x १०० फुट असुन गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमी आहे.
 |
कातळात खोदलेल्या पायऱ्या , सोनगड
|
पठारावरून गडावर चढाई करताना सर्वप्रथम कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. त्या चढायला सुरुवात केली की डाव्या बाजूला निवडूंगाचा फड दिसतो. त्याखाली खांब टाके आहे.
 |
| सोनगडाच्या कातळटप्प्यावरील समाधी आणि खाली दूरवर दिसणारे भोजापुर धरण |
टाक पाहून परत वाटेवर येउन चढायला सुरुवात केल्यावर पायऱ्यांच्या बाजूलाचा दोन पावले कोरलेला समाधीचा दगड पाहायला मिळतो.
या पायऱ्या चढत मधेच पायवाट परत पायऱ्या असे करत आपण गडाच्या सुळक्याखाली पोहोचतो. सुळक्याखालुन वर पहिले असता आपल्याला गडाची तटबंदी दिसुन येते. कोसळणारी तटबंदी सावरण्यासाठी तटबंदीच्या खाली एक भलामोठा ओंडका ठेवलेला आहे.
 |
| सोनगड किल्ल्याचे उध्वस्त प्रवेशद्वार |
येथे कड्यात पायऱ्या कोरलेल्या असुन शेजारील कपारीत दगडाला शेंदुर फसलेला आहे. येथे गडाचा मुख्य दरवाजा असण्याची शक्यता आहे.
 |
| टाक |
या ठिकाणाच्या वरील बाजुस उजव्या हाताला कड्यालगत पाण्याची दोन टाकी खोदलेली दिसतात. थोडे सांभाळूनच तेथे जावे लागते. याच टाक्याला लागून काही पायऱ्याही कोरलेल्या दिसतात पण त्या कुठेही न जाता मधेच गायब झालेल्या आहेत. उभ्या कातळात असल्यामुळे जाऊन पाहताही येत नाहीत. टाक्याकडून पंधरा-वीस फुट चढुन आल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
गडमाथ्यावर रचीव दगडांच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. येथे समोरच डौलाने फडकणारा भगवा ध्वज व पांढऱ्या रंगात रंगविलेले मंदीर असुन आत खंडोबाची मुर्ती आहे.
मंदिराच्या बाहेर पडझड झालेले बांधकाम असुन त्यात एक गंजलेला लोखंडी नगारा व अलीकडील काळातील एक दगडी मानवी शिल्प आहे. या शिल्पासमोर दोन लहान नंदी ठेवलेले आहेत.
मंदीरामागे कातळात खोदलेले भलेमोठे पाण्याचे टाके असुन या टाक्यात पाणी जमा करण्यासाठी कातळात चर खोदलेले आहेत. येथुन समोर जाणारी वाट किल्ल्याच्या सोंडेकडे जाते. येथे कधीकाळी तोफ असल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसुन येतात. गडाची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नसले तरी त्यांचे अस्तित्व मात्र जाणवते. समोरच पर्वतगडाचे पठार दिसुन येते. दूरवर आड किल्ला दिसतो. हा गडाचा सर्वोच्च भाग असुन असुन येथुन भोजापुर धरण व दूरवरचा प्रदेश दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास पंधरा मिनीटे पुरतात. सोनगडाचा वापर केवळ टेहळणी करीता होत असावा. हे सर्व पाहुन आल्यावाटेने खाली उतरावे व पठारावरून पर्वतगडाकडे निघावे.
 |
| पर्वतगड आणि दिसणारा लहानसा सोनगड |
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्ग या दिवाळी अंकातील श्री.कैलास रसाळ, श्री चंद्रशेखर बर्वे यांचे लिखाण'
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
४) दुर्गभ्रमंती नाशिकची- अमित बोरोले
५) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
६) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
७) https://treklikevaibhavsachin.blogspot.com, http://invisiblepranav.blogspot.com हे ब्लॉग
८) www. trekshitiz.com हि वेबसाईट
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हे तालुक्याचे गाव मध्ययुगात यादव घराण्याची पहिली राजधानी होती . सिन्नरचे सुंदर कलाकुसर असलेले गोंदेश्वर मंदिर , एकतेश्वर मंदिर या परिसरात असलेले किल्ले एकेकाळच्या या ऐश्वर्यसंपन्न राजधानीची साक्ष देत उभे आहेत. कुठलेही राज्य सुरळीत चालण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो महसूल . शेतीशी तुलना करता व्यापार हे महसूल मिळविण्याचे सर्वात विश्वासार्ह साधन आहे . त्यामुळे सर्व राजांनी व्यापाराला बळकटी देण्यासाठी बंदरे तयार केली , बाजारपेठा वसवल्या . या बंदरे , बाजारपेठा , राजधानी यांना जोडणारे व्यापारी मार्ग तयार केले . या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागेवर किल्ले बांधले . सिन्नर - अकोले या राजधानी आणि बाजारपेठेला जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर सोनगड आणि पर्वतगड हे दोन जोड किल्ले आजही उभे आहेत.
सोनगड पर्वतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे सोनेवाडी . भाटघर धरणाच्या काठावर हे वसलेल बर्यापैकी सधन गाव आहे . आम्ही डोंबिवलीहून रात्री्चा प्रवास करुन पहाटे सोनेवाडीत दाखल झालो. ऱस्त्याला लागूनच शाळा होती. प्रवासाने आंबलेल अंग मोकळे होणे आणि सकाळी दोन किल्ले पाहणे यासाठी विश्रांती आवश्यक होती. शाळेच्या व्हरांड्यात स्लीपिंग बॅगा पसरल्या आणि मस्त ताणून दिली. भटकंती करता करता इतक्या वर्षात अशा किती शाळा आणि मंदिरांच्या वळचणीला झोपलो हे आठवताना झोप कधी लागली हे कळलेच नाही . तासाभरात पाखरांच्या आवाजाने जाग आली. कवी कल्पनेत गुंजारव, मंजुळ स्वर इत्यादी अनेक उपमा दिल्या असल्या तरी त्यादिवशी तो आवाज अर्धवट झोप झाल्याने कर्कश वाटत होता . त्या आवाजाने सगळेच उठले होते. त्यामुळे सकाळची आन्हीक उरकण्याच्या मागे सगळे लागले. तुषारने पेट्रोलवर चालणारा नवीन अमेरीकन स्टोव्ह आणला होता . प्रचंड वाऱ्यामुळे तो कुठे पेटवायचा हा प्रश्न होता शेवटी एक कोपरा मिळाल तिथे स्टोव्ह पेटवून चहा बनवला. चहा पिउन होइपर्यंत उजाडले होते.
 |
| Night stay at Sonewadi school |
अर्धा जून महिना सरला होता पण याभागात पाऊस सुरु झाला अजून नव्हता. दोन्ही किल्ले बघायला चार ते पाच तासांचा अवधी लागणार होता . त्यामुळे पहिला किल्ला उन्हाचा ताप वाढण्या आधी बघून झाला, तर दुसऱ्या किल्ल्यासाठी स्टॅमिना राहील हा विचार करुन किल्ल्याच्या दिशेने निघालो गाव अजून जाग होत होते .
सोनेवाडीतल्या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने थोडेसे अंतर चालत गेल्यावर उजवीकडे एक पडका वाडा दिसला. या वाड्याच्या दरवाजाची लाकडी चौकट आणि वाड्यातील कमानी अजून टिकून होत्या त्यावर नेटकी कलाकुसर केलेली होती. वाड्यापासून ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. याठिकाणी टेकडीवर काही घरे आहेत त्यामुळे टेकडीवर चढायला पायऱ्या आहेत. या पायऱ्यानी आपण ५ मिनिटात टेकडीवर पोहोचतो. टेकडीवरुन समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठाराच्या उजव्या बाजूला गावाच्या मागेच असलेला डोंगर म्हणजे पर्वतगड दिसतो, तर पठाराच्या डाव्या बाजूला कातळटोपी असलेला डोंगर म्हणजेच सोनगड दिसतो. या दोन्ही किल्ल्यावर जाणारी वाट या दोन डोंगरान्मधील खिंडीतून जाते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीकडे जातांना वाटेत वनखात्याने पाणी अडवण्या जिरवण्यासाठी जागोजागी चर खोदलेले होते. त्या चरांच्या बाजूला योग्य जागा शोधून आम्ही जमिनीत खड्डे खणायला सुरुवात केली. वर्षभर जमवलेल्या सोबत आणलेल्या विविध झाडांच्या बिया पेरायला सुरुवात केली. भटकंती सोबत दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला आम्ही वेगवेगळ्या किल्ल्यांवर अशाप्रकारे बियाही पेरतो.
 |
| बीजारोपण |
 |
| सोनगड आणि पर्वतगड मधील खिंड |
पठारावरून किल्ल्यावर पोहोचायला १५ मिनिटे लागतात. वाटेत एके ठिकाणी डाळींबाची बाग केलेली होती. बिया पेरण्याचे काम चालू असल्याने आमचा वेग मंदावलेला होता. मजल दरमजल आम्ही खिंडीपाशी पोहोचलो. याठिकाणी मस्त वारा वाहात होता. खड्डे खणून घामेजलेल शरीर रिलॅक्स करण्यासाठी इथे थोडावेळ आराम केला. खणण्यासाठी आणलेली हत्यारे म्यान केली आणि पुढच्या चढाईला तयार झालो. किल्ल्याचा डोंगर पूर्व पश्चिम पसरलेला आहे. त्यावर पश्चिमेस कातळ टोपी आहे. त्यामुळे दुरुन हा डोंगर शंकराच्या पिंडीसारखा दिसतो . या डोंगरावर अर्ध्या उंची पर्यंत वनखात्याने झाडे लावलेली आहेत. त्या झाडीतून तिरके तिरके चढत गेल्यावर साधारणपणे १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगराच्या पूर्व टोकाकडे पोहोचतो. इथून एक डोंगरधार खाली उतरत रस्त्यापर्यंत जाते. या डोंगरधारे वरुनही किल्ल्यावर चढून येता येते. पण त्यासाठी सोनेवाडीच्या पुढे २ किमी जावे लागते. तिथे एक शाळा आणि दर्गा आहे.
दर्ग्या जवळून येणारी ही वाट सोनेवाडी गावातून येणाऱ्या वाटेला जिथे मिळते, त्याठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर आपण कातळ टोपीच्या पायथ्याशी पोहोचतो. समोरच कातळ टप्प्यावर कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्या चढायला सुरुवात केली की डाव्या बाजूला निवडूंगाचा फड दिसतो. त्याखाली खांब टाके आहे. टाक पाहून परत वाटेवर येउन चढायला सुरुवात केल्यावर पायऱ्यांच्या बाजूलाचा दोन पावले कोरलेला समाधीचा दगड पाहायला मिळतो. पुढे चढत गेल्यावर डाव्या हाताला रचीव तटबंदीचे अवशेष दिसतात. त्या खाली कातळाला पांढरा रंग मारलेला आहे. या ठिकाणी किल्ल्याचे प्रवेशव्दार असावे. उध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करुन काही पायऱ्या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडमाथ्यावर रचीव दगडांच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. तटबंदी ओलांडून पुढे गेल्यावर पांढऱ्या रंगाने रंगवलेले खंडोबाचे मंदिर दिसते. मंदिरा बाहेर उघड्यावर कावस आहे . त्याच्या बाजूला एक दगडी भांडे पडलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक वेगळीच मूर्ती आहे. त्या मुर्ती समोर दोन छोटे नंदी ठेवलेले आहेत. मंदिरात खंडोबाची मुर्ती आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूला प्रचंड मोठे कोरडे टाके आहे. या टाक्यापासून पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम टोकावर पोहोचतो. येथून समोरच पर्वतगड पसरलेला दिसतो. त्याच्या मागे दुरवर आडचा किल्ला दिसतो. पूर्वेला भाटघर धरण दिसते. किल्ल्याच्या टोकावर भन्नाट वारा होता . नाश्ता करायला ही जागा अतिशय योग्य होती. पोटपूजा करुन आल्या मार्गाने किल्ला उतरायला सुरुवात केली. १५ मिनिटात गडाच्या पायथ्याशी खिंडीत पोहोचलो.
(सोनगडावरुन पर्वतगड आणि परिसराचा पाहाण्यासाठी खालील व्हिडीओ प्ले करा )
समोर पर्वतगड आडवा पसरलेला दिसत होता पण किल्ल्यावर जाणारी पायवाट सापडत नव्हती. गावातील लोकांचा या भागात फारसा वावर नसावा. सकाळपासून आम्हाला कोणी गावकरी, गुराखी या भागात दिसला नाही . त्यामुळे आजपर्यंतचा अनुभव वापरुन पायवाट शोधायला सुरुवात केली. खिंडीतून गावाच्या दिशेला तोंड करुन तिरके पर्वतगड चढण्यास सुरुवात केली. पायवाट सापडत नव्हती पण साधारणपणे १५ मिनिटे चढल्यावर एका सपाटीवर पोहोचलो. या ठिकाणी ठळक पायवाट बाभळीच्या वनात शिरताना दिसली. या वाटेने ५ मिनिटे चढल्यावर एका कातळटप्प्याशी पोहोचतो . हा कातळ टप्पा चढण्यास थोडा कठीण आहे. तो १० मिनिटात पार केल्यावर समोर निवडुंगाची पुरुषभर उंचीचे फड दिसायला लागले. या निवडुंगाच्या मधून जाणाऱ्या पायवाटेने साधारणपणे १० मिनिटे चढल्यावर एका मोठ्या तलावापाशी पोहोचलो. तलाव सुकलेला होता एका कोपऱ्यात थोड पाणी आणि त्याच्या बाजूला चिखल होता. तलावात उतरल्यावर आमच्या चाहूलीने चिखलात बसलेल्या बेडकांच्या फौजेने पाण्यात उड्या घेतल्या. पाण्याच्या दुसऱ्या बाजूने गेल्यावर त्या बाजूच्या बेडकानी पाण्यात उड्या मारल्या . हा खेळ बराच वेळ चालू होता . सध्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या काजव्या महोत्सवाला टफ कॉंपिटीशन म्हणून पुढच्या वर्षी बेडूक महोत्सव इथे भरवू या अशी कल्पना मांडली. त्यावर इतरांनी पण त्यात भर घातली. भरपूर हसल्यामुळे सगळा थकवा निघून गेला. खरच सध्याचा ट्रेंड बघता असा बेडूक महोत्सव भरवला तर हौशी लोकांची कमतरता नक्कीच भासणार नाही. तलावाच्या डाव्या बाजूला पाण्याची तीन टाकी आहेत . त्यातील एक टाक बुजलेले आहे . टाकी पाहून तलावाला वळसा घालून एका टेकडावर पोहोचलो . हे किल्ल्याचे सर्वोच्च स्थान आहे .
येथून आड किल्ला , डुबेरा किल्ला , सोनगड आणि भाटघर धरण दिसते. इथे तर भन्नाट वारा सुटला होता एका जागी उभे राहाणे मुश्किल होत होते . त्यामुळे तिथे योग्य जागा बघून बसकण मारली . कितीही वेळ इथे बसल तरी समाधान झाल्यासारखे वाटत नव्हते. पण कातळटप्पा उतरायचा होता आणि खिंडीत उतरणारी पायवाट पण शोधायची होती . त्यामुळे किल्ला उतरायला सुरुवात केली . कातळटप्पा उतरल्यावर उंचीवरून गवतामुळे अस्पष्ट झालेली पायवाट दिसली . या पायवाटेने खिंडीत उतरायला १५ मिनिटे लागली. दोन्ही किल्ले वेळेत बघून झाले होते . हाती वेळ उरला होता तो सत्कारणी लावण्यासाठी पर्वतगडाच्या उतरावर खड्डे खोदून उरलेल्या बिया पेरल्या आणि परतीचा प्रवास चालू केला.
(पर्वतगडावरुन सोनगड आणि परिसर पाहाण्यासाठी खालील व्हिडिओ प्ले करा )
जाण्यासाठी : - सोनगड आणि पर्वतगड या किल्ल्याच्या पायथ्याशी सोनेवाडी हे गाव आहे . सोनेवाडी गावात पोहोचण्यासाठी मुंबईहून घोटी मार्गे सिन्नर गाठावे. सिन्नर - पुणे रस्त्यावर सिन्नरहून १० किमी अंतरावर गोदेवाडी फाटा आहे . हा रस्ता थेट अकोलेला जातो. या रस्त्यावर गोंदेवाडी - दापूर - चापडगाव - सोनेवाडी हे अंतर १६ किमी आहे . सोनेवाडी ते अकोले १७ किमी सोनेवाडी ते सिन्नर २३ किमी आणि सोनेवाडी ते नाशिक ५३ किमी अंतर आहे . सिन्नर आणि अकोलेहून दर तासाला सोनेवाडीला जाण्यासाठी एस टी बसची सोय आहे . सिन्नर आणि गोदेवाडीहून सोनेवाडीसाठी जीप्स आहेत .
दोन्ही किल्ल्यांवर पिण्यालायक पाणी नाही. किल्ले पाहाण्यासाठी ५ तास लागतात. पर्वतगडावर रॉकपॅच असल्याने पावसाळ्यात किल्ल्यावर जाणे टाळावे .
सिन्नर रेंज कधीपासून करायची होती... कशी आणि कोणाबरोबर करायची तेच कळत नव्हते, माहिती अगोदरच काढली होती.. शेवटी संपुर्ण माहिती काढून प्लॅन बनवला, बाकीची माहिती मी अमित बोरोलेचे पुस्तक 'दुर्गभ्रमंती नाशिकची' यातून घेतली. तारीख २५-२७ मार्च ठरवली त्यात ६ किल्ले आणि ४ मंदिरे करायचे ठरवले.. नेहमीप्रमाणे विनयची काहीतरी अडचण आली आणि त्याने सुरवातीलाच माघार घेतली.. मग नेहमीच्या ट्रेकिंगवाल्या व्हॉट्सप ग्रुपवर विचारुन बघितले आणि कुणाल कदम ,हेमेश तांडेल ,प्रसाद नायकने लगेच होकार दिला, एखादी लहानशी गाड़ी करुन ट्रेक करायचे ठरवले, लगेचच मी आमचा नेहमीचा रथसारथी असीमला फोन करुन त्याची गाडी बुक केली.
निघायचा दिवस आला,सगळे गुरुवारी ऑफिस मधून लवकर घरी आणि घरी जाऊन रात्री 12 वाजता ठाणे स्टेशनला भेटले, असीम त्याची इंडिका घेऊन आलाच होता.मुंबई-नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे 10 मिनिटासाठी चहासाठी कसाऱ्याला थांबलो आणि तडक नाशिक शहर पार करून सिन्नर बसस्थानकडे पुन्हा थांबा घेतला, तेवढंच सिन्नर बसस्थानक आम्ही फिरून घेतले. मला नेहमीप्रमाणे गाडीत काही झोप येत नव्हती, जिपिएस चालू केला,सोनगड आणि पर्वतगडच्या पायथ्याचे गाव सोनेवाडीला 5.30 वाजता पोहचलो,अजून सूर्याचे दर्शन होण्यास वेळ असल्याने एका मंदिराजवळ गाडी लावली आणि मंदिरातच झोप काढायची ठरवले, बाहेर बरीच थंडी होती त्यात मी स्लिपिंग बॅग आणली नव्हती म्हणुन माझ्या झोपेचे खोबरे होणार हे त्यात आपसूक आलेच.कशीबशी 10 मिनिटे झोप काढली आणि उठून बसलो. 6.30 वाजले आणि थोडे उजडायला आले होते, बाकीच्यांना सुद्धा आवरायला सांगितले, मोठी बॅग गाडीत ठेवून लहान बॅग घेतली, गाडी आणल्याचा अजून एक काय तो उपयोग.😉
इथे सुरवातीलाच मी मोठा घोळ घातला,कॅमेऱ्याची लेन्स जरा जास्तच साफ करता करता माझा कॅमेराच बंद पडला आणि माझा मात्र मूड गेला.पण ट्रेक महत्वाचा असल्याने मोबाईलने फोटो काढायचे ठरवले,पर्वतगड आणि सोनगड समोरासमोर असल्याने दोन्ही किल्ले लवकर होणार होते, पहिला सर्वानुमाते पर्वतगड करायचा ठरवला, पर्वतगडाला अशी मळलेली वाट नसल्याने थोडा घोळ झालाच, थोडे चढल्यावर लहानशी सपाटी लागते तिकडूनच उजव्या बाजूची वाट पकडली आणि ती वाट बरोबर पर्वतगडावर घेऊन जाते, हेमेश वाट शोधत अगोदरच किल्ल्यावर पोहचला होता, आम्ही बाकीचे सुद्धा किल्ल्यावर आलो आणि अवशेष शोधायला लागलो,
एक पावसाळी तलाव आणि 2 टाक्या सोडून बाकी काहीच अवशेष नव्हते,पण किल्ल्यावरून सोनगड आणि बाजूला असलेल्या भोजपुर धरणाचे विहंगम दृश्य दिसत होते, डाव्याबाजूने दूरवर आडचा किल्ला आणि बाजूला पवनचक्कीची रांग दिसत होती, सगळे डोळ्यात भरून आम्ही दुसऱ्याबाजूने उतरायचा केविलवाणा प्रयत्न केला, एक 10-15 फुटाचा अवघड रॉकपॅच उतरायचं आल्याने माघार घेतली,इथेच आमचा एक तास फुकट गेला...
पुन्हा किल्ल्यावर आलो, पोटात कावळे ओरडायला लागले होते म्हणुन जे आणले होते त्यावर आडवा हात मारला, क्षुधाशांती झाल्याने किल्ला आलेलो त्या मार्गाने झपाझप उतरायला सुरुवात केली,पुन्हा सपाटीवर आलो,ज्या मार्गाने आलो होतो तिकडे घसारा जास्तच होता म्हणुन दुसऱ्या बाजूने सोनगडच्या समोर असलेल्या घळीतून उतरायला सुरवात केली ही वाट त्यातल्या त्यात तुलनेने सोपी होती.. आता पुढचे टार्गेट होते सोनगड किल्ला, पर्वतगड उतरणाच्या नादात बराच वेळ फुकट गेला असल्याने सोनगड शक्य तितक्या लवकर करण्याचे ठरवले,10.30 वाजले होते आणि लवकरच सोनगडच्या पायऱ्या लागल्या. अवघ्या 15 मिनिटत सोनगडच्या माथ्यावर पोहचलो,समोरच लांबच्यालांब पसरलेला अजस्त्र पर्वतगड दिसत होता,गडावर लहानसे मंदिर होते आम्ही त्याच्याच आडोशाला 10 मिनिटे बसलो, आता ऊन चांगलेच डोक्यावर आले होते, मंदिरात कुतुहूल निर्माण करणारी बुद्धा सारखी मूर्ती ठेवली होती, मंदिरामागे गढुूळ पाण्याचे टाके आहे,त्यामुळे हे दोन्ही किल्ले करताना पाण्याचा योग्य साठा स्वतःकडे ठेवावा किंवा सोनेवाडीत पाणी भरून घ्यावे ...किल्ला पाहून आता उतरायला सुरुवात केली आणि 20 मिनिटात सोनेवाडीत पोहचलो...गावात कुणालने पाणी भरून घेतले, उन्हाळ्याचे दिवस असल्याने आम्ही गाडीत 15 लिटरचा अगोदरच साठा करून ठेवला होता...
 |
| सोनगड आणि त्यावरील वास्तू |
आता गाडी थेट आजच्या तिसऱ्या किल्ल्याकडे ठाणगाव मार्गे वळवली, लोकांना विचारात विचारात गाडी आडगडाकडे नेत होतो, रस्ता विचारता विचारता एकाठिकाणी उसाच्या रसाची गाडी लावलेली दिसली, मग तिकडेच थोडावेळ आम्ही रसासाठी बस्तान मांडून बसलो.. प्रत्येकी २-3 ग्लासाचे घोट घेऊन निघालो आणि सकाळपासून धड असे काहीच खाल्ले नव्हते,म्हणुन गाडी नाश्त्यासाठी हॉटेल कडे वळवली...भरपेट नाश्ता करून गाडी आडवाडीकडे असीमने पळवली,आडवाडी येण्यापूर्वी सुजलॉन कंपनीने लावलेल्या भल्यामोठ्या पवनचक्या तुमचे आ वासून स्वागत करतात,कमी रहदारीचा रास्ता आणि बाजूला पवनचक्क्या त्यामुळे तुम्हाला फोटो काढण्याचा मोह तर नक्कीच होईल,आम्ही तो नाईलाजाने टाळून साधारण २ वाजता आडगडच्या पायथ्याला असलेल्या आडवाडीत पोहचलो,खाली गावात वाट विचारली आणि पुढे चढायला सुरुवात केली,
 |
| १) आडवाडीतून दिसणारा आडगाड २) किल्ल्यावरील खोदीव टाकीं ३) गडावरचा उध्वस्त दरवाजा ४)आडुबाईची गुहा आणि मंदिर |
इकडेसुद्धा बऱ्याच ढोरवाटा फुटल्या असल्याने वाट चुकलो,खालून एका शेतकरीबाईने आम्हाला इशाऱ्याने वाट दाखवली. वाट तुलनेत सोपी असली तरी प्रसादचे सकाळप्रमाणे पाय लटपटत होते.. कसाबसा त्याला धीर देऊन आम्ही वरती चढत होतो आणि ३० मिनिटात आम्ही गडावर पोहचलो, किल्ल्यावर खोदीव टाकींची कमतरता नव्हती...गाववाल्यांनी नुकतेच गडावरचे गवत जाळून ठेवल्याने सगळीकडे जमीन करपट दिसत होती, २.३० वाजले होते,मार्च महिन्याचा उन्हाचा तडाखा प्रसादला अगोदरच बसला होता...कुठे अवदसा आठवली आणि या ट्रेकला हो म्हणालो असा काही प्रसादचे झाले होते, हेमेश सुद्धा उन्हामुळे वैतागला होता त्यामुळे गडावरचा उध्वस्त दरवाजा मी आणि कुणालच बघून आलो...
आता मला आडुबाईची गुहा शोधायची होती, खूप वेळ शोधून सुद्धा मला आणि कुणालला काही वाट सापडत नव्हती, इकडे प्रसाद गड उतरायला सांगत होता, पण गुहा शोधल्याशिवाय खाली उतरणार नाही असे मी सांगितले आणि पुन्हा गुहा शोधायला सुरवात केली...तेवढ्यात कुणालाचा गुहेकडे जाणाऱ्या पायऱ्या सापडल्याचा आवाज आला आणि सगळे तिकडेच वळलो,प्रसाद सुद्धा नाईलाजाने तयार झाला...गुहेच्या वाटेने जात असताना आडुबाईच्या दर्शनाला दुसऱ्या वाटेने आलेली काही लहान मुले आणि माणसे भेटली...पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत असल्याने इथे सुद्धा प्रसादने का कू करायला सुरुवात केली, त्याला कसबसे खाली उतरवले, गुहेकडी जाणारी वाट अरुंद असल्याने ती जरा जपूनच पार करावी लागते...
५०-६० माणसे आरामशीर झोपतील एवढी गुहा प्रशस्त होती, गुहेत गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आडुबाईची मूर्ती होती...गुहेतच कडेला एक खोली बनवण्यात आली होती..बाजूला असलेल्या टाकीत गढूळ पाणी संपायला आले होते. इकडे हेमेशने आणलेल्या व्हेज पुलाववर आम्ही ताव मारला आणि त्यानंतर बाकीच्यांनी थोडीशी डुलकी काढली आणि १५ मिनिटाने गडावरून सुरुवात केली, गुहेजवळचा अरुंद रस्ता आणि तुटक्या पायऱ्या चढून वर आलो....आलो त्याच मार्गाने उतरायला सुरुवात केली,इथे पुन्हा प्रसादला मदत करून गाडीजवळ ५ वाजता पोहचलो. आजचे 3 किल्ले योग्य वेळेत झाल्याने समाधान वाटत होते.जाताना पवनचक्क्या जवळ ग्रुप फोटो घेतला.
http://invisiblepranav.blogspot.com/2016/08/blog-post.html
इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे
पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच
नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासात त्याची नोंद नाही असे अनेक किल्ले आज
विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशाच अनेक गडापैकी एक गड किल्ले सोनगड.
पर्वतगड आणि सोनगड हे जोडकिल्ले असुन एका खिंडीने वेगळे झाले आहेत. यातील
सोनगड हा चिंचोळा माथा असणारा लहान आकाराचा किल्ला तर पर्वतगड हा मोठया
विस्ताराचा किल्ला आहे. एक दिवसाच्या भेटीत हे दोनही किल्ले सहजपणे पाहुन
होतात. नाशिकहून फक्त ५०कि.मी. तर सिन्नरहुन दापूरमार्गे केवळ २६ कि.मी.
अंतरावर असणाऱ्या या गडाकडे गिरीमित्रांचे पाय फार क्वचीतच वळतात. सतत
उपेक्षित राहिलेल्या या गडांची माहिती सहजतेने सापडतही नाही. सोनगड हा
किल्ला भोजापुर गावांच्या मागे डोंगरावर उभा आहे.
चिंचोळ्या माथ्याचा हा गड पुर्व-पश्चिम पसरलेला असुन गडाची पायथ्यापासुन
उंची १००० फुट आहे. गडाची लांबी रुंदी ४०० x १०० फुट असुन गडाचे माथ्यावरील
एकूण क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमी आहे. सिन्नरपासुन २५ कि.मी.अंतरावर
भोजापुर गाव आहे. भोजापुरच्या पुढे ३ कि.मीवर कासारवाडी गाव आहे. या दोनही
गावातुन सोनगडावर एका तासात जाता येते. भोजापुर गावातून कासारवाडी गावाकडे
जाताना कासारवाडी फाटा येण्यापुर्वी वाटेत एक हनुमान मंदीर आहे. या
मंदिरासमोरून उजव्या हाताला जाणारा रस्ता सोनगडाकडे जातो. हा रस्ता खुपच
खराब असल्याने गाडी वाटेतील दर्गा अथवा शाळेकडेच ठेवावी व शाळेतील नळावरून
पिण्याचे पाणी भरून घ्यावे. गडावर पाण्याची तीन टाकी असली तरी त्यातील पाणी
पिण्यायोग्य नाही. येथुन समोरच माथ्यावर खंडोबाचे देऊळ असणारा छोटा सोनगड
दिसतो. गाडी ठेवुन दर्ग्याच्या बाजूने जाणाऱ्या वाटेने सोनगड समोर ठेवत १५
मिनिटे चढल्यावर आपण सोनगडच्या सुळक्याच्या खालील पठारावर येतो. या पठारावर
आपल्याला उध्वस्त घरांचे चौथरे दिसुन येतात. यातील एका चौथऱ्यावर एक
शिवपिंडी व तिच्यालगत नंदी ठेवला आहे. या पठारावरून उजव्या बाजूची वाट
पर्वतगडला जाते तर सरळ जाणारी वाट सोनगडवर जाते. या पठारावरून अर्ध्या
तासात गडाच्या माथ्यावर जाता येते. सोनेवाडी गावातून खिंडीतून येणारी वाट
येथेच येते पण ती थोडी लांबची व गैरसोयीची आहे. पठारावरून गडावर चढाई
करताना सर्वप्रथम कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढत मधेच
पायवाट परत पायऱ्या असे करत आपण गडाच्या सुळक्याखाली पोहोचतो. वाटेत एका
ठिकाणी पादुका कोरलेले दोन दगड नजरेस पडतात. सुळक्याखालुन वर पहिले असता
आपल्याला गडाची तटबंदी दिसुन येते. कोसळणारी तटबंदी सावरण्यासाठी
तटबंदीच्या खाली एक भलामोठा ओंडका ठेवलेला आहे. येथे कड्यात पायऱ्या
कोरलेल्या असुन शेजारील कपारीत दगडाला शेंदुर फसलेला आहे. येथे गडाचा मुख्य
दरवाजा असण्याची शक्यता आहे. या ठिकाणाच्या वरील बाजुस उजव्या हाताला
कड्यालगत पाण्याची दोन टाकी खोदलेली दिसतात. थोडे सांभाळूनच तेथे जावे
लागते. टाक्याकडून पंधरा-वीस फुट चढुन आल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश
होतो. येथे समोरच डौलाने फडकणारा भगवा ध्वज व पांढऱ्या रंगात रंगविलेले
मंदीर असुन आत खंडोबाची मुर्ती आहे. मंदिराच्या बाहेर पडझड झालेले बांधकाम
असुन त्यात एक गंजलेला लोखंडी नगारा व अलीकडील काळातील एक दगडी मानवी शिल्प
आहे. या शिल्पासमोर दोन लहान नंदी ठेवलेले आहेत. मंदीरामागे कातळात
खोदलेले भलेमोठे पाण्याचे टाके असुन या टाक्यात पाणी जमा करण्यासाठी कातळात
चर खोदलेले आहेत. येथुन समोर जाणारी वाट किल्ल्याच्या सोंडेकडे जाते. येथे
कधीकाळी तोफ असल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसुन येतात. गडाची तटबंदी, बुरुज,
प्रवेशद्वार अस्तित्वात नसले तरी त्यांचे अस्तित्व मात्र जाणवते. समोरच
पर्वतगडाचे पठार दिसुन येते. हा गडाचा सर्वोच्च भाग असुन असुन येथुन
भोजापुर धरण व दूरवरचा प्रदेश दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास पंधरा मिनीटे
पुरतात. सोनगडाचा वापर केवळ टेहळणी करीता होत असावा. हे सर्व पाहुन
आल्यावाटेने खाली उतरावे व पठारावरून पर्वतगडाकडे निघावे. इतिहासाची पाने
चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती मिळत नाही. सोनगडच्या पायथ्याशी
शाळा व दर्गा असून शाळेत पाण्याची टाकी व नळ असल्याने येथे निवासाची सोय
होऊ शकते.
© Suresh Nimbalkar
मागे जा
Post Views:
350
इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे
पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच
नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासात त्याची नोंद नाही असे अनेक किल्ले आज
विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशाच अनेक गडापैकी एक गड पर्वतगड.
पर्वतगड आणि सोनगड हे जोडकिल्ले असुन एका खिंडीने वेगळे झाले आहेत. एक
दिवसाच्या भेटीत हे दोनही किल्ले सहजपणे पाहुन होतात. नाशिकहून ५०कि.मी.तर
सिन्नरहुन केवळ २६ कि.मी. अंतरावर असणारा हा गड सतत उपेक्षित राहिला आहे
कारण या गडांची माहिती सहज सापडत नाही. पर्वतगड हा किल्ला भोजापुर
गावांमागे सोनगडाशेजारी उभा आहे. स्थानिक लोक पर्वतगडाला पर्वता म्हणुन
ओळखतात. आयताकृती आकाराचा हा गड उत्तर-दक्षिण पसरलेला असुन गडाची
पायथ्यापासुन उंची ९५० फुट आहे.
गडाची लांबी रुंदी १३०० x १००० फुट असुन गडाचे माथ्यावरील क्षेत्रफळ २५
एकरपेक्षा जास्त आहे. सिन्नरपासुन २५ कि.मी.अंतरावर भोजापुर गाव आहे.
भोजापुरच्या पुढे ३ कि.मीवर कासारवाडी गाव आहे. या दोनही गावातुन
पर्वतगडावर दीड तासात जाता येते. भोजापुर गावातून कासारवाडी गावाकडे जाताना
कासारवाडी फाटा येण्यापुर्वी वाटेत एक हनुमान मंदीर आहे. या मंदिरासमोरून
उजव्या हाताला जाणारा रस्ता या दुर्ग जोडीकडे जातो. हा रस्ता खुपच खराब
असल्याने गाडी वाटेतील दर्गा अथवा शाळेकडेच ठेवावी व शाळेतील नळावरून
पिण्याचे पाणी भरून घ्यावे कारण गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गाडी
ठेवुन दर्ग्याच्या बाजूने जाणाऱ्या वाटेने सोनगड समोर ठेवत १५ मिनिटे
चढल्यावर आपण सोनगडा खालील पठारावर येतो. या पठारावर आपल्याला उध्वस्त
घरांचे चौथरे दिसुन येतात. यातील एका चौथऱ्यावर एक शिवपिंडी व नंदी ठेवला
आहे. या पठारावरून उजव्या बाजूची वाट पर्वतगडला जाते तर सरळ जाणारी वाट
सोनगडवर जाते. याशिवाय भोजापूर गावातुन एका सोप्या पायवाटेने सोनगड व
पर्वतगड यांच्यामधील खिंडीत येता येते. पठारावरून खिंडीकडे जाताना
सर्वप्रथम आपल्याला पाच-सहा बांधीव पायऱ्या लागतात. आपण बरोबर वाटेला
असल्याची हि खुण समजावी. या नंतर परत दोन ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या
लागतात. या पायऱ्या चढुन पुढे पायवाटेने सोनगडाच्या डोंगराखालून आपण
अर्ध्या तासात आपण सोनगड व पर्वतगड यांच्या मधील खिंडीत येतो. खिंडीतून
समोरच अस्ताव्यस्त पसरलेला पर्वतगड दिसतो. पर्वतगडावर सहसा कोणी जात
नसल्याने मळलेली अशी वाट नाही. खिंडीतून पर्वत गडाच्या उत्तर दिशेला तिरकस
वरवर चढत गेल्यावर आपण पर्वतगडच्या भोजापुर गावच्या दिशेने उतरणाऱ्या एका
सोंडेखाली येतो. या सोंडेवरून सोपे प्रस्तरारोहण करून आपण पर्वतगडच्या
माथ्यावर पोहोचतो. प्रस्तरारोहण करता येणे मात्र गरजेचे आहे. पर्वतगडाला
किल्लेपणाच्या कोणत्याही खुणा दिसत नाहीत. माथ्यावर आल्यावर समोरच एक
उंचवटा दिसतो. या उंचवट्याच्या डाव्या बाजुला एक मोठे बांधीव तळे आहे.
तळ्याकडे जाताना वाटेत एका ठिकाणी वास्तुचा चौथरा दिसुन येत. गडावर
कोणाचाही वावर नसल्याने खूप मोठया प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे
असलेले अवशेष गवतात लपले आहेत. तलावाच्या खालील बाजुस उतारावर कातळात
खोदलेली पाण्याची दोन मोठी टाकी दिसुन येतात. हि दोनही टाकी शेवाळाने भरली
आहेत. याशिवाय गडावर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. येथुन समोर उंचवट्यावर
जाता येते. हा गडाचा सर्वोच्च भाग असुन येथुन संपुर्ण किल्ला व भोजापुर
धरण तसेच दूरवरचा प्रदेश दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरतो. हे
सर्व पाहुन आल्यावाटेने खाली खिंडीत उतरावे व भोजापुर अथवा सोनगडच्या
दिशेने निघावे. इतिहासाची पाने चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती
मिळत नाही. सोनगडच्या पायथ्याशी शाळा व दर्गा असून शाळेत पाण्याची टाकी व
नळ असल्याने येथे निवासाची सोय होऊ शकते.
© Suresh Nimbalkar
मागे जा
Post Views:
123
सोनगड आणि पर्वतगड..अविनाश असं चैतन्य (Trek to Songad and Parvatgad)
पाऊस जरा रुजायला लागला की आपल्याकडे आळंबीसारखे अगणित ट्रेकर्स प्रत्येक शनिवार-रविवारी उगवतात. मुंबई-पुण्याच्या आसपास असलेल्या गड-किल्ल्यावर तर जत्रा भरते आणि मग काही ऐकू नये अश्या गोष्टी कानावर येतात. आम्ही या जत्रांमध्ये न बावरता, पावसाचा अंदाज घेऊन लहानमोठे आणि एकाकी ठिकाणं शोधतो.
यावेळी आम्ही सिन्नरची सोनगड आणि पर्वतगड ही जोडगोळी निवडली. गड लहान असल्याने मुलांनाही घेऊन जायचं ठरवलं आणि म्हणून मग गेल्या आठवड्यात पावसाने घातलेलं रेड-ऑरेंजच थैमान लक्षात घेवून चारचाकी घेऊन जाण्याचा बेत केला. एक जुना मित्र, अविनाश पण जॉईन झाला आम्हाला या वेळी. माझ्या मुलीने माघार घेतली, कारण आलेला वायरल आणि आईचा ताप! सकाचिनचा चैतन्य होता बरोबर. असे आम्ही चारजण, चारचाकीवर पहिल्यांदाच, दोन लहान किल्ले करायला निघालो. खरंतर गेल्या रविवारचा प्लॅन होता पण या दिवशी मी सहकुटुंब गटारीला प्राधान्य दिलं कारण आजच्या/पुढच्या रविवारी एकादशी होती! सचिनच्या शिव्या खाल्ल्या पण... असतात काही गोष्टी ट्रेकपेक्षा चविष्ट!!
शनिवारी रात्री ११.३० च्या दरम्यान गाडी गेटच्या बाहेर निघाली आणि नाशिकमार्गे सिन्नरच्या पुढे एका गावात सकाळी चारच्या सुमारास ब्रेक घेतला. पावसाने गाडीचे वायपर बंद करण्याची वेळ पूर्ण प्रवासात आणू दिली नव्हती. गाडीतच आम्ही दोन तास आराम केला आणि ६ ला निघालो 'सोनवाडी' साठी, सोनवाडी हे दोन्ही किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. वाटेत एका ठिकाणी चहा घेतला, फक्त ५ रुपयात मावशींनी कप भरून चहा दिला आणि त्यात साखर मात्र शंभर-एक रुपयाची घातली. कपभर साखरेने गोड झालेलं तोंड घेऊन आम्ही सोनवाडी गावात, रस्त्याच्या कडेला एका कौलारू विठ्ठल मंदिरासमोर गाडी पार्क केली आणि गावातील शाळेसमोरील सिमेंटच्या रस्त्यावर पायपीट सुरू केली. सोनवाडी एक लहानसं गावं, गावात काही जुन्या बांधणीची घर आणि वाडे उध्वस्त अवस्थेत आहेत. ५-१ मिनिटात आम्ही गावच्या मागच्या टेकडीवर पोहोचलो. इथून उजव्या बाजूला असलेला डोंगर म्हणजे पर्वतगड आणि डावीकडे सोनगड. पुढे १५ मिनिटात आम्ही दोन्ही गडांच्या खिंडीत येऊन पोहोचलो. समोर एका लहानशा टेकडीच्या बाजूने वाट गडावर जाते पण ती वापरात नसल्याने सापडली नाही आणि आम्ही नेहमीच्या सवयीप्रमाणे चुकलो होतो. खिंडीच्या बाजूने गडाला अँप्रौच नव्हता म्हणून मग दुसऱ्या बाजूने वाट शोदायाचं ठरवलं. डोंगरउतारावर झाडीतून डावीकडे साधारण अर्धा तास चालल्यावर आम्हाला वाट सापडली. वाट काय गावकऱ्यांनी केलेला हमरास्ताच होता तो. या वाटेवर काही पावलं चालल्यावर काही दगडी पायऱ्या लागल्या. या वाटेवर मधेमधे खूप ठिकाणी कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. वाट एका लहानश्या टेकाडावर घेऊन आली, समोर कातळ टोपीच्या आकाराचा सोनगड, त्यावर कोरलेल्या पायऱ्या आणि मागे सुंदर गडपरिसर पाहायला मिळाला. पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि रिमझिम सुरू झाली पावसाची. आमच्यापैकी अविनाश तर गाडीतून उतरल्या पासूनच रेनकोट आणि हातात पाण्याची बाटली घेऊन तयारीत होता. आम्ही असे लाड करत नाही स्वतःचे, जेवढं भिजता येईल तेवढं भिजून घेतो. आम्हाला बघून त्यानेपण नंतर तो उतरवला होता. या सोप्या पायऱ्यांची वाट सर करायाला, नवीन पिढीच्या चैतन्यला पुढे केलं आम्ही म्हातारे त्याला फॉलो करायला लागलो, बारीक नजर ठेवून. पुढे वाटेत दोन पावले कोरलेले समाधीचे दगड आहेत. पुढे गेल्यावर काही आजून पायऱ्या सर करून डाव्या बाजूला तटबंदीचे अवशेष पाहायला मिळाले. इथे कातळाला पांढरा रंग दिलेला आहे आणि एक देव उभा केला आहे. बहुतेक इथे कधीकाळी प्रवेशद्वार असावे. या प्रवेशद्वारासमोरच एक खांबटाक आहे, बहुतेक गावकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी साफ केलं होतं हे. या टाक्याचा उल्लेख कुठे वाचला नव्हता आम्ही. आत उतरून पाहिलं तर त्यात आयताकृती ब्लॉक कोरलेले होते, कशासाठी माहीत नाही. याच टाक्याला लागून काही पायऱ्याही कोरलेल्या दिसल्या पण त्या कुठेही न जाता मधेच गायब झालेल्या होत्या. उभ्या कातळात असल्यामुळे जाऊन पाहताही आलं नाही. इथून मागे फिरून गडावर आलो. समोर खंडोबाच लहान मंदिर आहे आणि त्याच्यासमोर दगडी कासव आणि भांड उघड्यावर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने गेल्यावर एक मोठं पाण्याचं टाक आहे. इथून पूढे किल्ल्याचे पश्चिम टोक आहे आणि समोर पर्वतगड उभा आणि दूरवर आड किल्ला आहे. किल्ल्याच्या पूर्व टोकावरून भाटघर धरण परिसर हिरवागार झालेला होता. लहानसा गडमाथा पाहायला अर्धा तास पण लागला नाही. खाली उतरून परत झाडीतून वाट काढत खिंडीत आलो. गुर घेऊन आलेल्या काकांनी पर्वतगडासाठी वाट विचारली आणि निराशा पाडून घेतली पदरात. मळलेली वाट नाही म्हणाले. मागून लांबून फिरून जा म्हणाले. बहुतेक त्यांना पण माहिती नव्हती.
खिडीतुन उजवीकडे पर्वतगड दिसत होता पण वाट कुठेच नव्हती. थोडा वेळ विचारविनिमय केला आणि समोर दिसणाऱ्या घळीतून उभं चढून जाऊ ठरलं. पुन्हा आम्ही झाडीत घुसलो पण या वेळी गड बदलला होता, पर्वतगड. गावाच्या दिशेला तोंड करून तिरक चढायला सुरुवात केली. अर्धा एक तासात बाभळीचे वन पार करून काही काही कातळटप्प्यांशी येऊन पोहोचलो. ही थोडाशी अवगढ चढण पार करून एका तलावासमोर आलो. पुढे निवडुंगाच्या झाडीत लपलेली आजून दोन पाण्याची टाकी होती. आणि समोरच एम टेकाड. हे टेकाड म्हणजे गडाचा माथा होता.
सोनवाडी हे पायथ्याचे गाव या किल्ल्यांच्या. मुंबईहून घोटीमार्गे सिन्नर पुढे पुणे रस्त्यावर १० किमी गोदेवाडी फाटा आहे इथून अकोले रस्तावर दापुर - चापडगाव - सोनेवाडी हे १६ किमी आहे. सिन्नरवरून सोनेवाडीसाठी दर एका तासांनी बसेस आहेत.
सोनगड आणि पर्वतगड दोन्ही करण्यासाठी साधारण ५ तास लागतात. आम्ही सकाळी ७.३० ला सूरु करून ११ वाजता गाडीला स्टार्टर मारला होता. ट्रेकभर रुसलेला पाऊस नाशिकात शिरताच प्रेम ओतू लागला होता. आमचा आजचा ट्रेक थोडा वेगळा होता, एकतर आम्ही दोनाचे चार झालो होतो, म्हणजे चैतन्य आणि अविनाश ऍड झाले होते आणि त्यात पहिल्यांदा राजशाही गाडीने प्रवास केला. सहज सोपा ट्रेक, कोणीही करावा, गर्दी टाळून!
- वैभव आणि सचिन.
युट्यूबवर पहा -
https://treklikevaibhavsachin.blogspot.com/2022/08/trek-to-dongar-and-parivartan.html
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सोनगड आणि पर्वतगड
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भाटघर धरणाजवळ सोनेवाडी हे लहानसे गाव सिन्नर अकोले मार्गावर आहे . या गावाच्या मागे सोनगड आणि पर्वतगड हे दोन किल्ले आहेत. एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहून होतात.
5 Photos available for this fort
Parvatgad
Parvatgad
Parvatgad
पहाण्याची ठिकाणे :
सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. याठिकाणी टेकडीवर काही घरे आहेत त्यामुळे टेकडीवर चढायला पायऱ्या आहेत. या पायऱ्यानी आपण ५ मिनिटात टेकडीवर पोहोचतो. टेकडीवरुन समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठाराच्या उजव्या बाजूला गावाच्या मागेच असलेला डोंगर म्हणजे पर्वतगड दिसतो, तर पठाराच्या डाव्या बाजूला कातळटोपी असलेला डोंगर म्हणजेच सोनगड दिसतो. या दोन्ही किल्ल्यावर जाणारी वाट या दोन डोंगरान्मधील खिंडीतून जाते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात.
खिंडीच्या मधोमध एक छोटीशी टेकडी आहे या टेकडीच्या डावी कडून जाणारी वाट सोनगड किल्ल्यावर जाते तर टेकडीच्या उजव्या बाजूकडून जाणारी वाट पर्वतगडावर जाते.
टेकडीच्या उजवीकडील पायवाटेने आपण तिरके चढाईला सुरुवात करावी (ही पायवाट सहजासहजी सापडत नाही . खिंडीतून गावाच्या दिशेला तोंड करुन तिरके पर्वतगड चढण्यास सुरुवात करावी ) साधारणपणे १५ मिनिटात आपण सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी ठळकवाट बाभळीच्या वनात शिरते . या वाटेने ५ मिनिटे चढल्यावर आपण कातळटप्प्याशी पोहोचतो . हा कातळ टप्पा चढण्यास थोडा कठीण आहे . तो १० मिनिटात पार केल्यावर समोर निवडुंगाची पुरुषभर उंचीची झाडे दिसतात . या निवडुंगाच्या मधून जाणाऱ्या पायवाटेने साधारणपणे १० मिनिटे चढल्यावर आपण एका मोठ्या तलावापाशी पोहोचतो. तलावाच्या डाव्या बाजूला पाण्याची तीन टाकी आहेत . त्यातील एक टाक बुजलेले आहे . टाकी पाहून तलावाला वळसा घालून आपण आलो त्याच्या विरूध्द बाजूस गेल्यावर एक टेकडी आहे . ती चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचतो.
येथून आड किल्ला , डुबेरा किल्ला , सोनगड आणि भाटघर धरण दिसते. खिंडीपासून किल्ला चढायला साधारणपणे पाउण तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
सोनगड आणि पर्वतगड या किल्ल्याच्या पायथ्याशी सोनेवाडी हे गाव आहे . सोनेवाडी गावात पोहोचण्यासाठी मुंबईहून घोटी मार्गे सिन्नर गाठावे. सिन्नर - पुणे रस्त्यावर सिन्नरहून १० किमी अंतरावर गोदेवाडी फाटा आहे . हा रस्ता थेट अकोलेला जातो. या रस्त्यावर गोंदेवाडी - दापूर - चापडगाव - सोनेवाडी हे अंतर १६ किमी आहे . सोनेवाडी ते अकोले १७ किमी सोनेवाडी ते सिन्नर २३ किमी आणि सोनेवाडी ते नाशिक ५३ किमी अंतर आहे . सिन्नर आणि अकोलेहून दर तासाला सोनेवाडीला जाण्यासाठी एस टी बसची सोय आहे . सिन्नर आणि गोदेवाडीहून सोनेवाडीसाठी जीप्स आहेत .
सोनगड आणि पर्वतगडाच्या मध्ये एक खिंड आहे . या खिंडीत जाण्यासाठी सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ उतरावे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. टेकडी चढून गेल्यावर समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात. खिंडीतून उजव्या बाजूची पायवाट पर्वतगडावर जाते.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही . गावातील शाळेच्या व्हरांड्यात रहाण्याची सोय होते .
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गावात नाही .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सोनेवाडी गावातून एक तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुन ते फ़ेब्रुवारी
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सोनगड आणि पर्वतगड
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भाटघर धरणाजवळ सोनेवाडी हे लहानसे गाव सिन्नर अकोले मार्गावर आहे . या गावाच्या मागे सोनगड आणि पर्वतगड हे दोन किल्ले आहेत. एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहज पाहून होतात.
8 Photos available for this fort
Songad
Songad
Songad
पहाण्याची ठिकाणे :
सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. याठिकाणी टेकडीवर काही घरे आहेत त्यामुळे टेकडीवर चढायला पायऱ्या आहेत. या पायऱ्यानी आपण ५ मिनिटात टेकडीवर पोहोचतो. टेकडीवरुन समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठाराच्या उजव्या बाजूला गावाच्या मागेच असलेला डोंगर म्हणजे पर्वतगड दिसतो, तर पठाराच्या डाव्या बाजूला कातळटोपी असलेला डोंगर म्हणजेच सोनगड दिसतो. या दोन्ही किल्ल्यावर जाणारी वाट या दोन डोंगरान्मधील खिंडीतून जाते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात.
खिंडीच्या मधोमध एक छोटीशी टेकडी आहे या टेकडीच्या डावी कडून जाणारी वाट सोनगड किल्ल्यावर जाते तर टेकडीच्या उजव्या बाजूकडून जाणारी वाट पर्वतगडावर जाते.
टेकडीच्या डावीकडील पायवाटेने आपण सोनगडाच्या पश्चिमेच्या डोंगरधारेच्या पायथ्याशी पोहोचतो . सोनगडची कातळटोपी पूर्व पश्चिम पसरलेली आहे . आपण खिंडीत सोनगडच्या पश्चिम टोकाखाली उभे असतो . याठिकाणी सोनगडच्या उतारावर जंगल आहे. या जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने तिरके चढत किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे जाण्यासाठी साधारण १५ मिनिटे लागतात. याठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. ( येथून किल्ल्याची डोंगरधार पूर्वेकडे उतरलेली आहे . सोनेवाडी पासून दोन किलोमीटर पुढे गेल्यास एक शाळा आणि त्यामागे दर्गा आहे . या दर्ग्यापासून येणारी पायवाट पूर्व डोंगरधारेवरुन कातळात कोरलेल्या पायऱ्यापाशी येते ) पायऱ्या चढून गेल्यावर आपण कातळ टोपीच्या पायथ्याशी पोहोचतो . समोरच कातळ टप्प्यावर कोरलेल्या पायऱ्या दिसतात. त्या चढायला सुरुवात केली की डाव्या बाजूला निवडूंगाचा फड दिसतो. त्याखाली खांब टाके आहे . टाक पाहून परत वाटेवर येउन चढायला सुरुवात केल्यावर पायऱ्यान्च्या बाजूलाचा दोन पावले कोरलेला समाधीचा दगड पाहायला मिळतो. पुढे चढत गेल्यावर डाव्या हाताला रचीव तटबंदीचे अवशेष दिसतात . त्या खालीला कातळाला पांढरा रंग मारलेला आहे . या ठिकाणी किल्ल्याचे प्रवेशव्दार असावे . उध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर काही पायऱ्या चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गडमाथ्यावर रचीव दगडांची तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात . तटबंदी ओलांडून पुढे गेल्यावर पांढऱ्या रंगाने रंगवलेले खंडोबाचे मंदिर दिसते . मंदिरा बाहेर उघड्यावर कावस आहे . त्याच्या बाजूला एक दगडी भांडे पडलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक वेगळीच मूर्ती आहे . त्या मुर्ती समोर दोन छोटेनंदी ठेवलेले आहेत . मंदिरात खंडोबाची मुर्ती आहे .
मंदिराच्या मागच्य बाजूला प्रचंड मोठे कोरडे टाके आहे . या टाक्यापासून पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पश्चिम टोकावर पोहोचतो. येथून समोरच पर्वतगड पसरलेला दिसतो . त्याच्या मागे दुरवर आडचा किल्ला दिसतो. पूर्वेला भाटघर धरण दिसते . गडमाथा छोटा असल्याने पाहाण्यासाठी अर्धातास पुरतो. सोनेवाडी गावातून सोनगड किल्ल्यावर जाण्यास एक तास लागतो. सोनगड आणि पर्वतगड पाहून सोनेवाडीत परत येण्यास चार ते पाच तास लागतात .
पोहोचण्याच्या वाटा :
सोनगड आणि पर्वतगड या किल्ल्याच्या पायथ्याशी सोनेवाडी हे गाव आहे . सोनेवाडी गावात पोहोचण्यासाठी मुंबईहून घोटी मार्गे सिन्नर गाठावे. सिन्नर - पुणे रस्त्यावर सिन्नरहून १० किमी अंतरावर गोदेवाडी फाटा आहे . हा रस्ता थेट अकोलेला जातो. या रस्त्यावर गोंदेवाडी - दापूर - चापडगाव - सोनेवाडी हे अंतर १६ किमी आहे . सोनेवाडी ते अकोले १७ किमी सोनेवाडी ते सिन्नर २३ किमी आणि सोनेवाडी ते नाशिक ५३ किमी अंतर आहे . सिन्नर आणि अकोलेहून दर तासाला सोनेवाडीला जाण्यासाठी एस टी बसची सोय आहे . सिन्नर आणि गोदेवाडीहून सोनेवाडीसाठी जीप्स आहेत .
सोनेवाडीतून दोन मार्गाने सोनगडावर जाता येते .
१) खिंडीतला मार्ग :- सोनगड आणि पर्वतगडाच्या मध्ये एक खिंड आहे . या खिंडीत जाण्यासाठी सोनेवाडी गावात रस्त्याला लागूनच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळ उतरावे . या शाळेच्या समोर एक सिमेंटचा रस्ता गावात शिरतो . या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडल्यावर आपण टेकडीच्या पायथ्याशी पोहोचतो. टेकडी चढून गेल्यावर समोर लांबलचक पसरलेले पठार दिसते . पठारावरुन मळलेल्या पायवाटेने खिंडीत पोहोचायला १५ मिनिटे लागतात.
२) पूर्व डोंगरधारे वरुन :- सोनगड किल्ल्याची एक डोंगरधार पूर्वेकडे उतरलेली आहे . सोनेवाडी गावाच्या पुढे अकोलेच्या दिशेने दोन किलोमीटर पु गेल्यावर रस्त्या लगत उजव्या बाजूला एक शाळा आणि त्यामागे दर्गा आहे . या दर्ग्यापासून पायवाट पूर्व डोंगरधारेवरुन किल्ल्यावर जाते .
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही . गावातील शाळेच्या व्हरांड्यात रहाण्याची सोय होते .
जेवणाची सोय :
जेवणाची सोय गावात नाही .
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
जाण्यासाठी लागणारा वेळ :
सोनेवाडी गावातून एक तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुन ते फ़ेब्रुवारी
Comments