Wednesday, July 12, 2023

पट्टा

   अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला “कळसूबाई रांग” म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. अलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे. तर औंढा, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे.या सर्व किल्ल्यांत पट्टा इतरांपेक्षा जास्तच भाग्यवान आहे कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींची चरणधूळ या किल्ल्याने आपल्या मस्तकी धारण केलीय. पट्टागड हा किल्ला बितनगड व औंढा यांच्या मधील टप्प्यात आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील हा गड आजही दिमाखात उभा आहे. पट्टागडावर शिवाजी महाराज काही काळ थांबल्याने हा गड विश्रामगड म्हणुन देखील ओळखला जातो.श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात अवंध व पट्टा किल्ल्य़ांचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिध्द !! 
यावरून यादव काळात हा गड अस्तित्वात होता. 






 गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. 
१) गडाच्या पूर्व दिशेला पायथ्याला लागून असलेल्या पट्टावाडी गावातून जाणारी वाट सगळ्यात सोपी आणि जवळची आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी घोटी- भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. टाकेद गावातून म्हैसमाळ घाटमार्गे कोकणवाडी फाटा ९ कि.मी. अंतरावर तर कोकणवाडी फाट्यापासून पट्टागडाच्या पायथ्याची पट्टावाडी ८ किमीवर आहे. पट्टावाडी हे गाव डोंगराच्या पठारावर वसलेले असुन गडाची समुद्रसपाटीपासून उंची ४५६६ फूट तर पायथ्यापासुन उंची ९०० फुट आहे. पट्टावाडी अकोले या अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याच्या गावापासून ३५ कि.मी. आहे. पट्टावाडीतून गडाची उंची साधारण २५० मीटर भरते.
२)  इगतपुरी - घोटी - टाकेद मार्गे
 कोकणवाडी गावातून गडाच्या दक्षिण दिशेने दुसरी वाट आपल्याला गडावर घेऊन जाते पण तुलनेने ही वाट अवघड आहे यासाठी मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणार्‍या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्यच्या पायथ्याशी जातो. टाकेदहून कोकणवाडी पर्यंत जीपसेवा उपलब्ध आहे. टाकेद ते कोकणवाडी हे अंतर पाऊण तासाचे म्हणाजे १० कि.मी.टाकेद ते कोकणवाडीपर्यंत जाण्यासाठी खाजगी जीप सेवा उपलब्ध आहे.  आहे. कोकणवाडीला येण्यासाठी दुसरी वाट एकदरा गावातून आहे. टाकेदच्या पुढेच हे एकदरा गाव आहे. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे ४ कि.मी आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. जीपवाल्याला थोडे अधीक पैसे दिले तर तो थेट टाकेद ते पट्टावाडीपर्यंत आणून सोडतो. पट्टावाडी हे गाव मुळातच डोंगराच्या पठारावर बसलेले आहे. पट्टावाडीतून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत पक्का डांबरी रस्ता झालेला आहे. रस्त्याच्या शेवटी वन खात्याने चौकी उभारलेली आहे. तेथे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी प्रौढांसाठी व मुलांसाठी प्रवेश शुल्क भरावे लागते. तसेच नाव व पत्ता नोंदवुन किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्याचा माथा गाठण्यास अर्धा तास लागतो. 

  ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही पट्टागडावर जाता येते सिन्नरवरुन ठाणगाव २० कि.मी. अंतर आहे तर ठाणगाववरुन पट्टागड १५ कि.मी आहे. पण तिरढेला जाणारी एस.टी.बस पट्टावाडी फाट्यावर थांबते. अकोलेवरुन तिरढेला दुपारी ४ वाजता बस आहे. हि बस तिरढेला मुक्काम करुन सकाळी ६.३० वाजता अकोलेला माघारी जाते.अकोले ते ठाणगाव हे अंतर ३० कि.मी. आहे..याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सांदण दरी याच परिसरात येतात .पट्टागडावर येण्यासाठी सिन्नरवरुन सकाळी ७.२५ व ९.०० तर कसार्यावरुन सकाळी ७.०० वाजता बस आहे.
Vast expanse of Patta fort seen on the way
 
३)  तिसरी वाट औंढा आणि पट्टा किल्ल्याच्या मधून वर येते. ही वाट सर्वात कठीण आहे. औंढावरुन पट्टाकडे जाणारी थेट पायवाट आहे. अंदाजे ५ एक किमी ची असेल. किंवा अवंढ वाडीतून अंदाजे ३९ किमी चा गाडी रस्ता आहे.  पट्टावाडीतून १५ मिनिटात गडाच्या पहिल्या गुहेजवळ जाता येते. किल्ला प्रचंड विस्ताराचा आहे. आपल्याला काय काय पाहायचे आहे ते आधीच ठरवून ठेवणे. 
   संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते.  खिरवडी मार्गे गेल्यास अगदी पट्टया प्रमाणे पसरलेला हा दुर्ग नजरेस पडतो म्हणून याला पट्टागड असे जुने नाव आहे .गडाच्या अगदी पायथ्यापर्यन्त गाडी जाते.
   अर्थात या परिसरात यायचे तर स्वतःचे वाहन असले तर अतिशय सोयीचे होते. नाशिक वा अकोलेवरुन पट्टागड एका दिवसात बघून होतो. नाशिकवरुन रेल्वेने या परिसरात यायचे झाल्यास देवळालीच्या अलिक्डे लहाविट स्टेशनला उतरतात.थोडे अंतर रेल्वे रुळावरुन चालत गेल्यास उजवीकडे बैलगाडी रस्ता लागतो.या रस्त्यावर दारणा नदीवरचा पुल ओलांडून शेणीत, बेलु अशी गावे घेत गिरवाडीला जाता येते. नाशिकवरुन भगुर-इगतपुरी रस्त्यानेही गिरवाडीला जाता येते. यासाठी कडवा कॉलनीतील उतरायचे.इथून धरणाच्या भिंतीवरुन चालत जात अर्ध्या तासात निनावी गावात पोहचायचे. औंढा गडाच्या पठाराची एक डोंगरसोंड या निनावी गावात उतरली आहे.तीने तासभराची चढाई करुन औंढावाडी गाव गाठायचे. यावरून वर चढून गेल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठारावरून उजवीकडची वाट पकडावी या वाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण औंढ्याच्या पायथ्याशी पोहोचतो. या किल्ल्याच्या पायथ्याशी वाट दुभागते. उजवीकडची वाट औंढा किल्ल्यावर जाते तर, सरळवाट पट्टा किल्ल्याकडे जाते. औंढा गड आणि चन्नागिरीचा डोंगर याच्यामध्ये खिंड आहे. या भागात पवनचक्क्या बसवल्या असल्यामुळे इथे रस्ता झाला आहे.त्याने पटागडाचा उत्तर पायथा गाठायला सुमारे दिड तास लागतात.इथलया खिंडीतून एक वाट पट्टावाडीत काते.या वाटेने पट्टावाडी गाठायला सुमारे तीन तास लागतात.या वाटेने पुढे गेल्यावर एक खिंड लागते. या खिंडीतून पुढे गेल्यावर समोरच पठार लागते. पठारावर देवीचे एक मंदिर आहे. मंदिराच्या मागून जाणारी वाट पुढे दुभागते. डावीकडची वाट पट्टावाडीत जाते, तर सरळ डोंगरसोंडेवर चढणारी वाट वीस मिनिटात एका कातळकड्या पर्यंत पोहोचते. कातळकड्याच्या डावीकडची वाट कड्याला चिकटूनच पुढे जाते. सुमारे २० मिनिटांत आपण दोन डोंगराच्या मध्ये पोहोचतो. समोरच पट्‌ट्याची तटबंदी आहे. वाटेतच एक पाण्याचे टाके लागते.
पट्टावाडीकडे जाताना वाटेवरूनच पट्टागडाच्या पुढे आलेल्या दोन डोंगरसोंडेवरील बुरुज व तटबंदी आपले लक्ष वेधून घेतात. पट्टावाडीतून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे. हा रस्ता संपताना डाव्या बाजुला एक पडीक वास्तू दिसुन येते. या वास्तुशेजारी एका झाडाखाली काही कोरीव मुर्त्या ठेवलेल्या दिसुन येतात. या रस्त्याच्या शेवटी वनखात्याची चौकी असुन येथे ५/- रुपये प्रवेश शुल्क भरुन व नावपत्ता नोंदवुन गडावर जाता येते. 
   गडावर चढाई करण्यापुर्वी या गडाच्या इतिहासात डोकावूया .गडाच्या इतिहासात डोकावले असता गडाला फार मोठा इतिहास असल्याचे कुठेही सापडत नाही. पण गडावरील पाण्याची सोय व अवशेषांची उपलब्धता पहाता गड नांदता असताना गडावर खूप मोठया प्रमाणावर वस्ती असावी. 
पट्टा हा गड इ.स. १३४७ मध्ये बहामनी सत्ता स्थापन झाल्यावर चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले गेले असावेत. म्हणजे ते बहुधा अल्लाउद्दीन बहामनशहा ( १३४७-५८) किंवा महमदशहा बहामनी पहिला ( १३५८ - १३७५) या कालावधीत बांधला गेला असला पाहिजे. त्यानंतर इ.स. १४८९-९० मध्ये मलिक अहमद निजामशहा ( १४९०-१५०९) याने जुन्नर कोकण परिसरातील किल्ले घेतले. आणि १४९० मध्ये बहामनी राज्याचे विघटान झाल्यावर लगेच निजामशाहीची स्थापना केली. पट्टागडाचा समावेश निजामशाहीत झाला. इ.स. १६२७ मधे मुगलांचा सरदार खानजहान याने नाशिक -अहमदनगरचा भाग जिंकून घेतला, त्यात हा किल्ला निजामाकडुन जिंकून घेतला. त्यानंतर पट्टागड मोघलांच्याच ताब्यात राहीलेला दिसतो, यावेळी तो महाबतखानाने जिंकला, मात्र   इ. स. १६७१ मध्ये मोरोपंतानी हा किल्ला जिकूंन स्वराज्यात दाखल केला. १६७२ मधे मोगलांनी हा किल्ला पुन्हा जिंकिन घेतला. इ.स.१६७५ म्धे मोरोपंत पिंगळ्यांनी पट्टगड परत स्वराज्यात आणला. 
१६  नोव्हेंबर १६७९ मधे मुघलांच्या ताब्यात असलेल्या जालान्याच्या संपन्न बाजारपेठेची लूट करुन शिवाजी महाराज रायगडाकडे येत असताना मोघल सरादार त्यांच्यावर चालून गेले,मात्र सगळ्यांचा पराभव करुन महाराज  संगमनेरकडे सरकले.मात्र औरंगाबादेवरुन रणमस्तखानाने महाराजांना अडविण्यासाठी पाठलाग सुरु केला. संगमनेरजवळ शिवाकी महाराजांनी सिदोजी निंबाळकर, संताजी घोरपडे,मानाजी मोरे यांना ठेवले. २४,२५,२६ नोव्हेंबर १६७९ ला संगमनेरजवळ मोठी लढाई झाली.त्यात सिदोजी निंबाळकर गोळी लागून ठार झाले, मात्र रणमस्तखान पराभून होउन औरंगाबादेच्या दिशेला पळून गेला. या लढाईत रणमस्तखानाबरोबर आसफखान व जाबीत्खान हे दोन सरदार होते. मात्र महाराज संगमनेरजवळ आल्याबर मोघलांची ताज्या दमाची फौज केसरसिंह राजपुत व सरदारखान यांच्या नेतृत्वाखाली महाराजांवर चालून आली. 
परिस्थिती बिकट आहे हे पाहून शिवाजी महाराजांनी रायगडाला जाण्याचा मार्ग ब्दलला. त्यावेळी बहिर्जी नाईकांनी जवळच्या वाटेने महाराजांना आणि जालन्यातून मिळालेल्या लुटीला सुरक्षितरित्या पट्टा किल्ल्यावर पोहोचवले.याचा उल्लेख सभासदाच्या बखरीत असा आला आहे ,'राजे बहिर्जी नाईकांवर खुष झाले,त्याजकडिल फाजील होते ते माफ करुन आणखी बक्षीस दिले'. म्हणजे बहिर्जी नाईकांकडे जे सरकारी कर्ज होते, ते माफ करण्यात आले. एकदा महाराज आणि मराठा सैन्य गडावर पोहचले कि वेढा घालण्यात अर्थ नाही हे जाणून मोघली फौजा निघून गेल्या. याबाबत खुद्द शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजेंना लिहीलेल्या पत्रात या घटनेचा उल्लेख आहे, 'तो ( मालमत्ता ) घेउन पट्टागड तर्फास स्वार होउन कुच करुन एता, रणमस्तखान व आसफखान व जाबीतखान असेच आणखी पाच-सात उमराउ आठ-दहा हजार स्वारानिशी आले. त्यास शहाबाजीच्या ( शहाबाज म्हणजे ससाणा ) हुन्नरे जैसी तंबी करुन ये तैसी तंबी करुन घोडे व हत्ती पाडाव करुन पटीयास आलो. सांगती लष्कर सांगतॉ लष्कर मुलुकात धुंदी करायास पाठविले. 'पट्टागडाचे मोक्याचे स्थान , त्याचा विस्तार याचा विस्तार याचा विचार करता इथे बर्यापैकी शिबंदी असली पाहीजे म्हणून शिवाजी महाराजांनी हा गड विश्रांतीसाठी निवडला असावा. इथली प्राचीन टाकी, गडाचा विस्तार, सामरिकदृष्ट्या महत्वाचे स्थान विचारात घेता कदाचित इथे नवीन बांधकामाला मंजूरी दिली असावी. तसेच पट्टागडावरुनच त्यांनी मोरोपंतांना सातमाळा-बागलाण प्रदेशातील किल्ले जिंकूण घेण्याचे आदेश दिले असले पाहिजेत.त्याप्रमाणे मोरोपंत पिंगळेनी डिसेंबर १६७९ ते जानेवारी १६८० या कालावधीत अहिवंत, नहावा ( मांगीतुंगी जवळ्चा रतनगड उर्फ न्हावी गड) जिंकून घेतले. या गडावर मुक्कामी असताना किल्लेदाराला नात झाली आणि शिवाजी महाराजांनी आपला कंठा नातीच्या गळ्यात घातला असे गावकरी सांगतात. या गडावर मुक्कामाला असतानाच युवराज संभाजीराजे दिलेरखानाशी वाद झाल्याने मोघलांपासून फुटून पुन्हा स्वराज्यात सामील झाल्याची आनंदाची बातमी शिवाजी महाराजांना मिळाली. शिवाजी महाराज येथून पन्हाळ्याकडे आणि नंतर काही काळ सज्जनगडावर राहून रायगडाला परतले. 
       खरतर एका दुर्गावर जन्मलेले ( शिवनेरी ) आणि गड्,कोटांचा प्रभावी वापर करुन स्वराज्य निर्माण केलेले आणि अंतैम श्वास एका महादुर्गावर ( रायगड ) घेतलेले शिवछत्रपतींना गडपती म्हणलेले आहे. स्वतः शिवाजी महाराज सांगतात , 'हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेत'. परंतु कदाचित सर्वच गडांना शिवाजी महाराजांच्या सहवासाचे भाग्य लाभले नाही. मात्र पट्टा गड याबाबतीत भाग्यवान म्हणायला हवा, शिवाजी महाराजांनी इथे विश्रांती घेतली म्हणून त्याला विश्रामगड हे नाव तर मिळालेच, पण महाराजांच्या कारकिर्दीच्या अंतिम काळात प्रत्यक्ष सहवास देखील लाभला. कारण नोव्हेंबर १६७९ मध्ये शिवाजी महाराज पट्ट्यावर होते. पण पुढे केवळ पाचच महिन्यत मराठा साम्राज्याच्या या मेरुमण्याचे रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी महानिर्वाण झाले. 
                   इ.स. १६८२ साली औरंगजेबाने महाराष्ट्रात पदार्पण केले आणि मराठी मुलूख ताब्यात घेण्यास सुरवात केली. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्यारा ताब्यात होता. यानंतर हा किल्ला मोघलांनी जिंकला.त्याची हकिकत अशी आहे. इ.स. १६८८ मध्ये मातबरखानाने औरंगजेबाकडे अर्ज पाठबिला.त्यात तो म्हणतो, 'या सेवकाने काही दिवसापासून एक हजार कोळी, भिल्ला आणि मावळे यांना पायदळात चाकतीला घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यात अस्णार्या पट्टा आणि इतर किल्ले यांच्या लगत असणार्या जमीनदारांना पैसा पुरवण्यात आला. तसेच त्यांना मनसब आणि इतर बक्षीसे देउन बादशाही कृपेचे पाईक बनवण्यात आले. हऱजी जाखडे आणि तरबीयतखान यांचे आपापसात वाकडे झाले होते.त्यामुळे हऱजी हा सिन्नर परगण्यातील आपल्या सोना ( सोनांबे ) या गावी जाउन बसला होता. त्याला रोख रक्कम, घोडा आणि शिरपाव हि दिला होता. उभे असलेले पथक त्याच्या दिमतीला देउन पट्टा किल्ला जिंकून घेण्यासाठॉ त्याला पाठवून दिले. तो किल्ला जिंकण्याची योग्य संधी शोधत होता,मात्र हि मोहींम काही पार पडण्याची लक्षण काही दिसत नव्हते, याला कारण म्हणजे तरबियतखानाने निर्माण केलेल्या अडचणी. याच सुमारास बादशहाने मला गुलशनाबाद्च्या ( नाशिकच्या ) ठाणेदारीवर नेमले. मी हरजीची हरप्रकारे समजूत घातली. बादशहाच्या राज्यारोहणाच्या एकतिसाव्या वर्षी ( जुलुस एकतीस ) रबीलवाल महिन्याच्या सतरा तारखेस ( ११ जानेवारी १६८८ ) सरकारी सैन्य आणि माझे काही पथके किल्ला घेण्याच्या कामावर रवाना केली. रबीलवाल तेवीस तारखेस म्हणजे १७ जानेवारी रोजी माझे सैनिक दोर लावून मध्यरात्री तटावर चढले आणि त्यांनी किल्ला जिंकून घेतला. या घटनेत उभयपक्षापैकी जे सैनिक मारले गेले आणि शत्रुपैकी जे लोक कैद झाले त्याचा तपशील पाठवण्यात येईल. या मोहिमेत मला पंचेचाळीस हजाराचे कर्ज काढावे लागले.ती रक्कम मोहिमेत खर्च झाली आहे. आपल्या कृपेने अल्पावधीत इतर अनेक किल्ले जिंकून घेण्याची आशा बाळगून आहे. मुहमद अफझल याला मी संगमनेरवरुन या मोहिमेसाठी बोलावून घेतले होते. त्याच्याबरोबर पट्टागडाच्या किल्ल्या पाठवित आहे. केशवदास बुंदेला याच्यासोबत भगुरचा ठाणेदार गोविंदराव याचे निम्मे पथक देउन केशवदासला तुर्त किल्ला सांभाळण्यास सांगितले आहे. गोविंदरावला किल्ल्याच्या पायथ्याच्या इलाख्यावर फौजदार म्हणून नेमले आहे.याशिवाय मातबरखान म्हणतो कि हा किल्ला ( पट्टा ) मोठा असून त्याच्याभोवती मराठ्यांचे किल्ले आहेत. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी दोन हजार तोपची लागतील. त्यास पाठविन्यात आले तर बरे होइळ.नसल्यास मला आज्ञा करावी. म्हणजे दोन हजार पायदळ उभारुन मी किल्ल्याची खात्रीलायक व्यवस्था करेन. तोपच्यांना औरंगबादच्या सरकारी खजिन्यातून दोन महिन्याचा आगावू पगार देण्याची व्यवस्था व्हावी.'
    मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठ्यांचे औंढा, त्रिंबकगड, कावनई, त्रिंगलवाडी, मदनगड किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांना जिंकून घ्यावा लागला.इ.स. १७६३-६४ मध्ये मोघल किल्लेदार सोभानसिंग हा होता. इ.स १६७१ मधे माधवरावांनी पट्टागड मुगलांकडुन जिंकला. अहमदनगरच्या किल्ल्यात पेशव्यांचा सरदार विठ्ठल वाघमारे हा होता. पुढे तो राघोबादादास सामिल झाला.कारभार्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर तो माळव्यात पळून गेला. राघोबादादांच्या मागावर माळव्यत गेलेल्या सरदार हरिपंत फडकेनी वाघमारेस पकडले, परंतु त्याला सोडून दिले. मात्र तरीही वाघमारेने फितुरीचा उद्योग चालूच ठेवला. तेव्हा पुढे वाघमारेला पकडून पट्टागडावर कैदेत ठेवण्यात आले. 
   कोळ्यांच्या मदतीने ऊठाव करणार्या देवीसिंह टोके याने या बंडखोरास दुसर्या बाजीरावने इथेच कैदेत ठेवले होते. यापुढे बंड करणार नाही या हमीवर त्याची सुटका जेली. 
त्यानंतर अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला. इ.स. १९३५ मधे सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या किल्ल्यावर झेंडा फ़डकवला होता.सप्टेंबर महिन्यात इथे मोठी सभा भरवून ध्वजारोहणाचा मोठा कार्यक्रम पार पडला. 
   पट्टा उर्फ विश्रामगडाचा नकाशा

  इतिहासात फेरफटाका झाल्यावर आता जाउया गडफेरीला. 


पट्टावाडीतून दिसणारा विश्रामगड उर्फ पट्टा
शिवकालीन बारव...कथितरित्या जिर्णोद्धार केलेले! 
सिमेंटने भरलेल्या दर्जा

पट्टावाडी हि जेमतेम वीस-पंचवीस घराची वस्ती.पट्टावाडीतून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत पक्का डांबरी रस्ता झालेला आहे. गडाच्या पायथ्याशी एक चौकोनी बांधीव बारव आहे. गावकरी या बारवेला शिवकालीन म्हणत असले तरी ती बहुधा तितकी जुनी नसावी. याशिवाय पट्टावाडी परिसरात जालना -संग्मनेर युध्दात धारातिर्थी पडलेल्या सरदार सिदोजी निंबाळकरांची समाधी आहे. मात्र ती सापडण्यासाठी एखादी स्थानिक व्यक्ती बरोबर असणे आवश्यक आहे.


पट्टावाडीकडून गडाच्या दिशेने निघाल्यावर गडाच्या पायथ्याशी आपल्याला एक तोफ पडलेली दिसते.

त्र्यंबक दरवाज्याच्या बाजूने वनविभागाने एक कमान उभी केली आहे 

 

रस्त्याच्या शेवटी वन खात्याने चौकी उभारलेली आहे. प्रौढांसाठी रुपये ५/- आणि लहान मुलांसाठी २/- भरुन आणि नाव पत्ता नोंदवुन किल्ल्यात प्रवेश करता येतो. या ठिकाणी गडावर सापडलेल्या काही प्राचीन वस्तु जतन करून ठेवलेल्या दिसतात (तलवार,नाणी,दागिणे,खडे,आदि ) 

किल्ला चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला एका चौथर्‍यावर हत्तीण व तीची दोन पिल्ल अस फ़ायबर मधे बनवलेल शिल्प बसवलेल आहे.

 त्याच्या आशी एका फलकावर गडाचा नकाशा आणि माहिती लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.


 
थोडा चढ चढुन गेल्यावर पायर्‍या लागतात. वनखात्याने पायर्‍या व्यवस्थित बांधलेल्या आहेत. पायर्‍यांच्या वाटेने वर चढतांना दोनही बाजूचा कातळ छिन्नी - हातोड्याने तासून गुळगुळीत केलेला दिसतो. जिथे कातळ उपलब्ध नव्हता अशी जागा बांधुन काढलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. 

इथे एक तोफ गाड्यावर व्यवस्थित मांडून ठेवलेली दिसते. 

वाटेत एक नव्याने उभारलेला दरवाजा दिसतो. 

पायर्‍यांच्या वाटेने वर आल्यावर एक चौकोनी गुहा दिसते . रांगत जाता येईल एवढीच या गुहेची उंची आहे. हि गुहा सध्या बुजलेली आहे. या गुहेत पाण्याचे टाक असावे. 



 

हि गुहा पासून पायर्‍यांच्या वाटेने वर गेल्यावर डावीकडे दोन गुहा लागतात. यातील एका गुहेमध्ये लक्ष्मणगिरी महाराज यांचे वास्तव्य होते. हे महाराज म्हणजे या परिसराचे दैवत. या लक्ष्मणगिरी महाराजांचे गेली दहा वर्ष याच गडावर वास्तव्य होते. त्यांच्यामुळे गावकर्यांनी या गुहेकडे जाणार्या रस्त्याची ,पायर्यांची सुधारणा जेली. पायथ्याशी भरपुर पाण्याची मोठी विहीर बांधलेली आहे. 
 ती गुहा सध्या कुलुप लावून बंद केलेली आहे.  दर पौर्णिमेला दरवाजा उघडला जातो असे त्या गुहेच्या बंद दरवाज्यावर लिहीले आहे. तर दुसऱ्या गुहेत चतुश्रुंगी देवीची मुर्ती आहे. गुहेच्या बाहेर पाण्याचा नळ असून गडाच्या वरच्या टाक्यातील पाणी नळाने इथे आणले आहे. या दोन्ही गुहेत व गुहेच्या समोर असलेल्या प्रशस्त प्रांगणावर पत्र्याचे झाकण आहे त्यात रहाण्याची सोय होते.
 गुहेच्या समोरच गडाचा वनखात्याने निवारा छत्री बांधलेला एक बुरूज असुन या भागात गडाची तटबंदी व तटावर जाणाऱ्या पायऱ्या आहे. 

या परिसरात माकडांची भली मोठी फौज धुमाकूळ घालत असते. 
बाजूची दुसरी छोटी गुहा उघडी असल्याने पाहायला मिळते. उजव्या बाजुलाही दोन गुहा आहेत. त्यातील मोठी गुहा सुध्दा कुलुप लाउन बंद केलेली आहे. या गुहेत भगवान शंकर,गणेश आणि जैन तीर्थंकर दिंगबर यांच्या मुर्तॉ आहेत. दुसरी गुहा उघडी असुन गुहेत राहाता येते. गुहेच्या समोर मोठी पत्र्याची शेड टाकलेली आहे. त्यात २५ ते ३० जण आरामात राहु शकतात.

 
 या गुहा पाहून पुढे निघालो कि गडाची तटबंदी सुरु होते. गुहेजवळून जाणाऱ्या पायऱ्या चढून वर गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि किल्ल्याच्या अवशेषांना सुरुवात होते. समोरच गडाचा उत्तराभिमुख त्रिंबक दरवाजा आजही उत्तम स्थितीत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला व वरील बाजुस बुरूज आहेत. येथून खाली उतरणारी वाट पट्टावाडीत जाते. त्रिंबक दरवाजा पाहून वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात.

दोन ताशीव कड्यामध्ये महाकाय बुरुज बांधून तटबंदी पक्की केली आहे. बुरुजाच्या थोडेसे पुढे गेल्यावर पाण्याचे एक टाके लागते.याच्या पुढे आणखी एक गुहा लागते. 

बाजुला पट्टाईच्या जुन्या मुर्ती...मधोमध सिमेंटमध्ये घडविलेल्या नव्या मुर्ती...

या गुहेत अष्टभुजा देवीची सिंहासनाधिष्ठीत मुर्ती आहे. या देवीला पट्टाई देवी असे म्हणले जाते. पट्टादेवीची मूर्ती सिंहासनावर आरुढ झाली असून अष्टभुजा स्वरूपात आहे. मूर्तीच्या उजव्या चार भुजापैकी एका भुजेमध्ये चक्र, दुसर्‍या भुजेमध्ये सुरा, तिसर्‍या भुजेमध्ये तलवार तर चौथी भुजा आशीर्वाद देणारी आहे. देवीच्या डावीकडील चार भुजांपैकी एका भुजेमध्ये शंख, दुसर्‍या भुजेमध्ये  गदा, तिसर्‍या भुजेमध्ये त्रिशूल आणि चौथ्या भुजेमध्ये ढाल आहे. देवीची साडी हिरव्या रंगाची असून चोळी लाल रंगाची आहे. अंबा देवीच्या बाजूला लिंबा देवीची उभी मूर्ती आहे. देवीचा उजवा हात आशीर्वाद देणारा असून डाव हातात कमळ आहे. या मूर्तीची स्थापना १६७२ ते १६७५ या दरम्यान झाली असे गावकरी सांगतात. या देवीवरुन या गडाला पट्टा नाव पडले असावे. हि गुहा स्वच्छ् आणि सुंदर आहे.इथे सात-आठ जण सहज मुक्काम करु शकतात.
पट्टाईदेवीच्या गुहेचे मुळ रुप

 

पट्टाई देवीचे जुने मंदिर पाडून त्याजागी उभे राहिले सिमेंटचे मंदिर...

या मंदीराचा अलिकडेच जीर्णोध्दार झालेला आहे. हे मंदीर पुर्वाभिमुख असून ते आता ऑईल्पेंटने रंगवले आहे. या मंदीराजवळ कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी लागतात. त्यातील पाणी गढूळ आहे.हेच पाणी नळाद्वारे खालच्या गुहेकड नेले आहे. 

त्र्यंबकदरवाजाच्या वाटेवरचे भग्न शिवमंदिर आजही असीम शांततेची अनूभूती...
 
 त्रिंबक दरवाज्याच्या खालच्या बाजुला एक भग्न शिवंंदीर लागते. इथे बरेच भग्न अवशेष आहेत. कदाचित हे मंदीर शिवकाळात उत्तम अवस्थेत असेल. शिवछत्रपतींनी या शिवलिंगाची पुजा केली असेल. मात्र आज ते भग्नावस्थेत पाहून खंत वाटते.





पट्टाई देचीच्या गुहेच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला थोडेसे खाली एक दरवाजा लागतो. याची कमान जमीनीच्या पातळीला असल्यामुळे लांबून नजरेला पडत नाही. या दरवाज्याची कमान छान नक्षीदार आहे. त्यातून खाली उतरण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. ज्या उतरुन आपण पट्टावाडीजवळ पोहचतो. उत्तराभिमुख असल्यामुळे याला 'दिल्ली दरवाजा' म्हणतात. 

– – –


मंदिराच्या मागील बाजुस असणाऱ्या उंचवट्यावर गडाचा बुरुज असुन वनखात्याने त्यावर निवारा छत्री बांधली आहे. मंदिरा समोरून पुढे जाउन पायवाटेने वर चढत जाताना जोत्यांचे अवशेष दिसतात व अखेरीस आपण एका प्रशस्त दगडी इमारतीपाशी येतो. या इमारतीला अंबरखाना म्हणतात.तीन घुमटयांचे छत असलेला हा अंबारखाना आतून बर्‍यापैंकी प्रशस्त. आतील कमानी, भिंती इति सारे बांधकाम अजुनही तग धरुन आहे हेच आपले भाग्य समजावे. गडावर पोहचताच अंबरखाना नजरेस पडतो याला राणीमहलही म्हणतात 
.एवढी एक इमारत गडावर बऱ्यापैकी दिसते. एकेकाळी हि इमारत अतिशय दुरावस्थेत होती गावकर्यांनी या इमारतीचा ताबा घेउन त्याचा गोठा म्हणून वापर करायला सुरवात केली होती.अंबरखान्यात शिरताच शेणा,मुताच्या वासाने नको जीब होई. 











मात्र अंबरखान्याची वनखात्याने डागडुजी केलेली असून बाहेरील बाजुस मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. अंबरखान्याला दोन छोटे दरवाजे असून बाहेर झेंडावंदनाचा एक खांब रोवला आहे. या इमारतीचे छ्त घुमटाकार असुन आत प्रशस्त दालने आहेत. या दालनात शिवचरित्रातील फायबरमध्ये बनविलेले अनेक प्रसंग लावण्यात आलेले असुन आतील मंचावर शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला फायबर पुतळा ठेवलेला आहे. बघताचक्षणी प्रत्येकजन नतमस्तक होतो
अंबरखान्याभोवती बाग फ़ुलवलेली आहे. अंबरखान्याच्या आवारात पाच-सहा वास्तूंचे चौथरे दिसतात. अंबरखाना पाहुन झाल्यावर किल्ल्यावरील अवशेष पाहाण्यासाठी अंबरखान्याच्या मागुन वरच्या दिशेने चढत जावे.
अंबरखाना पाहुन झाल्यावर किल्ल्यावरील अवशेष पाहाण्यासाठी अंबरखान्याच्या मागे जाउन वरच्या दिशेने चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. या किल्ल्याची उंची १३९२ मीटर आहे .पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे.



 

पट्टागडाच्या माथ्यावरुन दिसणारे महांकाळ आणि बितनगड
 
माथ्यावरून उजव्या बाजुला दूरवर औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो.महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजेच कळसुबाई व ट्रेकर्सलोकांमध्ये उंचीचे स्थान मिळवणारे ‘अलंग-मदन-कुलंग’ हे दुर्गत्रिकुट हा नजारा दिसतो. एका बाजुला आड किल्ला तर दुसर्या वाजुला बितनगड आणि महांकाळ दिसतात. गडाच्या माथ्याकडे जाताना वाटेत पाण्याची टाकी दिसतात. प्रचंड वाऱ्याचा झोत अंगावर घेत आणि  बाजूच्या खोल दरीचे भय अनुभवत आपण माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर याशिवाय बुजलेली पाण्याची टाकी, उधवस्त चौथरे, एक पडलेला दरवाजा आणि शिवकालीन महादेवाचे मंदिर दिसते. गडमाथ्यावर बऱ्यापैकी झाडी आहे. या झाडीतच म्हाळुंगी नदीचे उगमस्थान आहे.

या पठारावर उजव्या बाजूला (औंढा किल्ल्याच्या दिशेला) गेल्यावर प्रथम पाण्याची दोन मोठी टाकी लागतात. त्याच्या पुढे सुकलेल टाक आहे. पुढे गेल्यावर एक गुहा लागते. गुहेत काही महिन्यांपूर्वी स्वच्छता मोहीम करत असताना वनविभागाला शिवकालीन धान्य, पणती, जाते आदी वस्तू सापडल्या. गुहेचे ओसरी आणि दालन असे दोन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली असुन दालन चार खांबांवर तोललेल आहे. गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची ७ टाकी दिसतात. पुढे गेल्यावर अजुन एक गुहा पाहायला मिळते. या गुहेच वैशिष्ट्य महणजे त्याच्या बाहेरच्या बाजुला जमिनीवर कातळात खोदलेले धान्य कोठार आहे. या धान्य कोठाराच्या दोन खिडक्या पाहायला मिळतात.


गुहेच्या पुढे चालत गेल्यावर एकामागोमाग एक अशी पाण्याची १२ टाकी पाहायला मिळतात. त्यांना "बारा टाकी" म्हणून ओळखतात. यातील शेवटच्या टाक्याच्या मागे कातळात कोरलेली गुहा आहे. बारा टाक्यातला गाळ वनखात्याने उपसलेला असुन त्यावर वृक्षारोपण केलेल आहे. बाराटाकी पाहुन पायवाटेने खालच्या बाजुला उतरल्यावर एक पाण्याच टाक पाहायला मिळत.
 
 
Near Saptateerth on Patta fort
जमीनीवर कोरलेले एक शिवलिंग व एक कोरीव शिळा उघड्यावर पहायला मिळते. अशीच जमीनीवर कोरलेली शिवलिंग याच परिसरातील मदन व कुलंगगडावर दिसतात. याचा अर्थ हे गड समकालीन असावेत.
 
  किल्ल्याचे दक्षिण टोक तटबुरुजांनी बांधून काढलेले दिसते. ज्याठीकाणी नैसर्गिक कातळकडा बेलाग वाटला नाही, त्याठीकाणी तटबंदी बांधून आणखी मजबुती आणली आहे. नैसर्गिक तटबंदी आणि मानवनिर्मित तटबंदीचा मिलाफ याठिकाणी झालेला आहे. 
         हे टाक पाहुन औंढा किल्ल्याच्या दिशेने सरळ जाणार्‍या वाटेने ५ मिनिटे चालल्यावर आपण दुसरा कोकण दरवाजापाशी पोहोचतो.या दरवाजाची रचना गोमुखी असून खाली उतरण्याचा मार्ग मात्र ढासळलेला आहे. दरवाजाची कमान उध्वस्त झालेली आहे. दरवाजाच्या बाजुला बुरुज आहेत. दरवाजापासून किल्ल्याच्या खालच्या अंगाला गेलेली तटबंदी ढासळलेली आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजुला पाण्याच टाक आहे. येथुन पुढे जाणार्‍या पायवाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते.



दरवाजा पाहुन आल्या मार्गाने परत फ़िरुन अंबरखान्या पर्य़ंत येऊन डावीकडे गेल्यावर काही वास्तूंचे अवशेष दिसतात. पुढे शिवकालिन बांधारा पाहायला मिळतो.अतिशय रेखीव बांधणीचे हे दोन बंधारे दोन टप्प्यात विभागले आहेत. याच्या दोन्ही बाजूला दोन ताशीव बुरुज आहेत. गडाच्या डाव्या टोकावर भव्य बुरुज आहे. हा बुरुज आपल्याला किल्ल्याच्या पायर्‍या चढतांना डाव्या बाजूस दिसलेला असतो. हा बुरूज पाहून खाली उतरणार्‍या वाटेने आपण पट्टादेवीच्या मंदिरापाशी येतो. तेथे आपली गड फेरी पूर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास २ ते ३ तास लागतात. पट्टागडावर दोन मोठ्या गुहा आहेत . या गुहांमध्ये राहण्याची सोय करता येते .किंवा गडावरील अंबरखाना मोठा आहे इथे आपण राहू शकतात. जेवणाची सोय मात्र स्वतः करावी लागते . पट्टावाडीत सुद्धा राहता येते . रात्री पट्टावाडीत मुक्काम करून सकाळी गड पाहण्यास जाता येते .
    एकेकाळी हा गड खुपच दुर्लक्षित होता.अगदी हौशी भटके आणी परिसरातील भाविक सोडले तर इथे फारस कोणी येत नसे,आता मात्र गडाचा खुपच विकास झाला आहे. ठाणगाव येथील काही युवकांनी तालुक्यातील जेष्ठ इतिहास संशोधक सुमंतकाका गुजराती याच्या मार्गदर्शनाखाली 'विश्रामगड विकास मंडळाची स्थापना केली आहे. वर्षातील तिथीप्रमाणे येणारी शिवजंयती,पारंपारीक शिवजंयती, शिवपदस्पर्श असे दिन हि संस्था साजरी करत असते. त्याबरोबर गडावरील पाण्याच्या टाक्याची साफसफाई करणे ,त्यातील गाळ काढणे , दरवाज्यावर वाढलेली झाडेझुडपे काढणे व येणार्या पर्यटकांचे प्रबोधन हि संस्था करत असते. गडाचे महत्व समजून गडप्रेमींना गडाकडे आकृष्ट करणे हा उद्देश साध्य होतो. गेल्या अनेक वर्षापासून हि संस्था शिवपदस्पर्श दिन साजरा करते आहे.या गडसंवर्धन कार्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना बर्‍यापैकी रोजगार उपलब्ध होत आहे. वनविभागाने याठिकाणी शुल्क आकारणी सुरू केल्यानंतर परिसराची निगा आणि जोपासना करण्यास त्याची मदत होत आहे. वनविभाग स्थानिक वृक्षांचे संवर्धन करताना नवीन झाडांची लागवड सातत्याने करून परिसर सुंदर करण्यासाठी प्रयत्नरत आहे. जागोजागी माहितीपत्रके व पर्यटकांसाठी सूचना फलक लावून स्वच्छतागृह, कचरा साठवण्यासाठी कचरा कुंड्यांची व्यवस्था करणे परिसराचे सौंदर्य जपण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या भागात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहे त्याचे जतन करणे व स्थानिक वैद्यांना प्रशिक्षित करून निसर्ग उपचार केंद्र या भागात सुरू करता येऊ शकते. त्याचबरोबर स्थानिक प्रजाती व झाडांचे जतन करून त्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करणे शक्य आहे
 या गडाला भेट देताना जर आपण सिन्नर-ठाणगावमार्गे गेलो तर वनश्रीत लपलेले सोमठाणे येथील शिवमंदीरालाही भेट देता येईल. 

गाईड व संपर्क : 8390-607-203
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
४) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
५)  www.trekshitiz.com  हि बेवसाईट
६) www.durgbharari.in हि बेवसाईट
७) 
http://vivektavatetreks.blogspot.com/2016/05/blog-post.html
http://ontheedgeofsahyadris.blogspot.com/2012/07/patta-fort-vishramgad.html
http://prashantpardeshi.blogspot.com/2019/10/terda-on-patta-fort.html
https://veersambhajiraje.blogspot.com/2013/02/blog-post_13.html
https://chawlaaashish.blogspot.com/2015/07/patta-fort-aka-vishramgad-fort-trek.html
https://www.maayboli.com/node/44528
https://hungrylittlepai-wordpress-com.translate.goog/2020/02/24/vishramgad-trek/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc
https://www.garvanemarathi.com/2021/01/patta-fort-or-vishramgad.html
https://www.akolemaza.com
https://www.esakal.com/image-story/photos-of-vishramgad-fort-nature-marathi-news-ppj97
https://www.loksatta.com/trekit/vishramgad-fort-in-nashik-1119159/

 हे ब्लॉग

 ८) दुर्गच्या दिवाळी अंकातील श्री.किरण बोर्हाडे यांचा लेख





 पट्टागड उर्फ विश्रामगड

पट्टागड उर्फ विश्रामगड

महाराष्ट्राला जसे विपुल दुर्गवैभव लाभलेय. तसेच ते अकोले तालुक्याच्याही वाट्यालाही आलेय. तालुक्याच्या पश्चिम सीमेवरून सह्याद्री पर्वताची मुख्य डोंगररांग उत्तरेकडून दक्षिणेकडे धावते. त्यात नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतला आडगड आणि औंढा या दुर्ग द्वयीसह अकोल्यातील विश्रामगड, बितनगड, अलंगगड, मदनगड, कुलंगगड, रतनगड, पाबरगड, भैरवगड, कलाडगड, हरिश्चंद्रगड, कुंजीरगड या राकट आणि बेलाग दुर्गांची मालिकाच आपल्याला भेटते. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाईचे शिखर याच दुर्गमालिकेत विराजमान आहे. यासगळ्या किल्ल्यांतील पट्टा उर्फ विश्रामगड इतरांपेक्षा जरा जास्त भाग्यवान म्हणावा लागेल. कारण साक्षात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींची चरणधूळ या किल्ल्याने आपल्या मस्तकी धारण केलीय. महाराजांच्या वास्तव्याने इथली माती पावन झालीय.पुलकित झालीय.





नगर आणि नासिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आजही हा गड ताठ मानेने मोठ्या दिमाखात उभा आहे. गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. अकोले या तालुक्याच्या गावापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर पट्टेवाडी गाव आहे. गडाच्या पूर्व दिशेला पायथ्याला लागून असलेल्या या गावातून जाणारी अवघ्या २५० मीटरची ही वाट सगळ्यात सोपी आणि जवळची आहे.











या किल्ल्याची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. एरियल व्ह्युने पाहिल्यास या किल्ल्याचा आकार आकाशातील पंख पसरलेल्या गरुडाप्रमाणे दिसतो! पट्टा किल्ला एका अर्थाने हिंदवी स्वराज्याची उत्तरेकडील सरहद्दच होती. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची एक हजार ३९२ मीटर (४५६६ फूट) इतकी आहे. इतिहास काळातल्या कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यास फार मोठा इतिहास या गडाला असल्याचे कोठे सापडत नाही. पण गडाचे तालेवार सोबती पाहता, तेथील भग्नावशेष पाहता या गडाचा उपयोग इतिहासकाळात नक्की झाला असेल,याची खात्री पटते.




एके काळी शत्रू सैन्यावर आग ओकणारी बुलंद तोफ आज मात्र गडाच्या पायथ्याशी निद्रिस्त अवस्थेत आहे. पूर्वेकडून चढाई करीत वर गेले की, पहिल्या टप्प्यात एका सरळसोट कातळात कोरलेल्या तीन गुहा आहेत. गडावर जाताना एका गुहेत थोर तपस्वी लक्ष्मण महाराजांची समाधी लागते. दुसऱ्या गुफेत काळ्या कातळातून पाझरलेले थंडगार पाणी आहे. आणखीन थोडे चढून वर गेले की, उत्तराभिमुखी त्र्यंबक दरवाजा येतो. त्याचे बांधकाम इतके भक्कम आहे, त्यामुळे आजही तो एकदम सुस्थितीत आहे.




किल्ल्याच्या पठाराकडे जाताना मध्येच एक देवीचे मंदिर लागते. भगवती देवीच्या मंदिराचे सध्या बांधकाम सुरु आहे. या मंदिराभोवती पुन्हा पाण्याची टाकी आहेत. ती कातळात कोरलेली आहेत. बहुदा ही यादवकालीन असावीत. अक्षया तृतीयेच्या दिवशी गडावर अष्टभुजा उर्फ भगवती या देवीची यात्रा भरते. परिसरातील आदिवासी भाविक मोठ्या संख्येने गडावर येतात.





एकूणच प्राचीन किल्ले आणि वास्तू यांच्याकडे पाहण्याचा उदासीन दृष्टिकोन आणि दुर्लक्ष यामुळे किल्ल्यावरील राजवाडा आता शेवटच्या घटका मोजतोय. पावसाळ्यात गाई-गुरांना निवारा म्हणून गुराखी या राजवाड्याचा वापर करतात. किरकोळ डागडुजी केल्यास हा महाल पुन्हा दिमाखाने उभा राहील. याखेरीज ऐन वेळी बाका प्रसंग उद्भवल्यास शत्रूला गुंगारा देण्यास किल्ल्यावरून निसटण्यासाठी येथे चोर दरवाजा आहे. हा चोर दरवाजा म्हणजे शिवकाळातील स्थापत्य विशेषाचा एक आदर्श असा नमुनाच. गडावर तब्बल ३० पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे.










पावसाळ्याच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात तिकडे तऱ्हेतऱ्हेची रानफुलं फुलतात. अनेक औषधी वनस्पती या परिसरात आढळतात. वर पोहोचल्यावर गडावरून पाहिले की, सभोवार चारही दिशांचा लांबवरचा मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो. लांबवर पश्चिमेस कळसूबाई,अलंग, मदन आणि कुलंग हे दुर्गत्रिकुट खुणावत राहते. दक्षिणेला बितनगड, महांकाळ डोंगर आणि उत्तरेला औंढा जणू आपल्याला हात पालवताहेत. इगतपुरी म्हणजे महाराष्ट्रातील धरणांचा तालुका. विश्रामगडावरच्या पश्चिम टोकाला उभे राहून पाहिले की विस्तीर्ण पसरलेल्या जलाशयांचे विहंगम दृश्य डोळ्यांना सुखावते. या गडाच्या पूर्व उतारावर म्हाळुंगी आणि आढळा या नद्या उगम पावतात.











आधी उल्लेख केल्याप्रमाणे अकोल्यातल्या इतर गडांपेक्षा विश्रामगड जास्त भाग्यवान म्हटला पाहिजे. कारण शिवस्पर्श झाल्याने ही भूमी पावन झालीये. सन १६७९मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. इतिहासकारांनी केलेल्या नोंदीप्रमाणे १५ नोव्हेंबर रोजी महाराजांनी ही लूट केली. सोने-नाणे, जडजवाहिर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. गोदावरी नदीच्या दक्षिण काठाने महाराज पुढे चालले होते. नाणेघाटमार्गे कल्याणवरून रायगड असे जाण्याचे नियोजन होते.
















दरम्यान, महाराज सोने-नाणे अशी लूट घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर पिसाळलेला मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळ दोन्ही सैन्यांची गाठ पडली. दिनांक १८, १९ आणि २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. संघोजी निंबाळकर खानाबरोबर भिडला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. अखेर तो धारातीर्थी पडला. महाराजांबरोबर असलेल्या साडेआठ हजार सैन्यापैकी चार हजार सैन्य कामी आले. शत्रू सैन्याने महाराजांना घेरले होते. त्यातच खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर येऊन धडकली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे व्हायचे. बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनिती निश्चित करण्यात आली.









राजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईक यांच्यासारख्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज मध्यरात्री संगमनेरहून पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. दाट जंगल आणि हिंस्र श्वापदे यांचा वावर. रामायण काळातले दंडकारण्य म्हणतात तो हाच परिसर. सगळ्या प्रतिकूलतेवर मात करीत महाराज गडावर सुखरूप पोहोचले. अर्थातच यात बहिर्जीचा मोठा वाटा होता.

संगमनेरजवळ आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे जवळपास १७ दिवस वास्तव्य या किल्ल्यावर होते. दक्षिणेच्या मोहिमेच्या दगदगीमुळे राजांची तब्बेत खालावली होती. येथील थंडगार, शुद्ध हवा आणि जीवाला जीव देणाऱ्या आदिवासीं महादेव कोळ्यांच्या कडेकोट पहाऱ्यात थकलेल्या राजांना विश्रांती मिळाली. पुढे राजे कल्याणमार्गे रायगडावर पोहोचले. गडावरून परतताना दस्तुरखुद्द राजांनीच या किल्ल्याचे नामांतर 'विश्रामगड' असे केले. परंतु याला पट्टा (किल्ला) का म्हणतात त्याचा मात्र उलगडा होत नाही. त्याचे तसे उल्लेख कुठे सापडत नाहीत. बाजीराव पेशव्यांचे वास्तव्य काही काळ गडावर होते.सह्याद्रीच्या या पुण्यभूमीला वंदन करायला, गडकोटांच्या अंगाखांद्यावर खेळायला आणि त्यावरचा इतिहास वाचायला आतुरलेले अनेक दुर्गभटके इथल्या रानवाटा तुडवत बाराही महिने फिरत असतात.











पहाटेच गावातून अत्यंत मळलेल्या वाटेने आम्ही पंधरा मिनिटांतच एका गुहेसमोर पोहोचलो. ही गुहा म्हणजे लक्ष्मणगिरी महाराजांचे समाधीस्थान आहे. महाराजांच्या दर्शनासाठी येथील पंचक्रोशीतील अनेक भक्तांचा राबता असतो. पौर्णिमेच्या दिवशीच या गुहेचं दार उघडत असल्याने या दिवशी येथे भक्तांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळेच या परिसरातील भक्तमंडळी पट्टागडाला लक्ष्मणगिरी महाराजांचा डोंगर म्हणूनदेखील ओळखतात. आम्हीही पौर्णिमेच्या दिवशीच आलो असल्याने येथे माथा टेकवूनच पुढे निघालो असता काही पाय-या पार करून दुसरी गुहा व त्याच्या शेजारीच गडाची अधिष्ठात्री पट्टाईदेवी समोर! ‘देवीच्या नावामुळेच या गडाचे  नाव पट्टागड पडले असावे’. 







तीन कमानीची अतिशय सुंदर व सुस्थितीत गडावर असलेली एकमेव वास्तू अंबारखाना.अंबारखाना डोळय़ात साठवतच आमची पावले गडाच्या दुस-या टोकाकडे चालली होती. वाटेतच बारा टाक्यांचा समूह भेटला. ‘बारा टाकी’ म्हणून प्रसिद्ध असलेली व एका रांगेत असलेली ही पाण्याच्या टाक्याची माळ मात्र थांबून पाहावी अशीच आहे. 









 पट्टागडाच्या टोकावर उभे राहिलो आणि समोरचा नजारा काय वर्णावा..? अहाहा.. व्वा.. जबरदस्त.. असे शब्द सर्वाच्याच तोंडातून अन् तेही एकदम उमटत राहिले. पट्टागडाची एक सोंड समोरच्या औंढया किल्ल्याकडे अर्धवर्तुळाकार गेली आहे. ही अर्धवर्तुळाकार डोंगरधार जमिनीपासून तीन स्तरांमध्ये आहे .पट्टागडाच्या टोकावर उभे राहिलो आणि समोरचा नजारा काय वर्णावा? सुंदर रमनीय देखावा. पट्टागडाची एक सोंड समोरच्या औंढया किल्ल्याकडे अर्धवर्तुळाकार गेली आहे. ही अर्धवर्तुळाकार डोंगरधार जमिनीपासून तीन स्तरांमध्ये आहे.


विरंगुळय़ाची ‘अनमोल’ शिदोरी पाठीशी बांधून देणारा हा पट्टागड एकदा तरी अनुभवावा असाच आहे.

http://vivektavatetreks.blogspot.com/2016/05/blog-post.html


















































पुढेच उजवीकडे अजुनही भक्कम स्थितीत असलेला उत्तरमुखी दरवाजा (दिल्ली दरवाजा) आपल्याला साद घालतो.. सुस्थितीत असलेली सुंदर कमान हीच खरी या दरवाज्याची शान आहे.. येथील बुरुजावरुन अगदी आडकिल्ल्यापासून सुरु झालेली वाटचाल नजरेस पडते.. अजुन वरच्या बाजूस चढून गेलो तर पटटाई देवीच्या मंदीराचे जीर्णोद्धाचे बांधकाम सुरु असल्याचे दिसले.. बाजूलाच पिण्याच्या पाण्याची टाकीदेखील आहे..या गडावर अगदी सुस्थितीत असलेले किल्ल्याचे अवशेष म्हणजे अंबारखाना जो मंदीराच्या पुढे वरती गेलो की नजरेस पडतो.. आम्ही अंबारखानाच्या दिशेने चढू लागलो तोच वातावरणात अचानक बदल झाला.. जोरकस वार्‍याने प्रवेश केला.. मागे वळून पाहिले तर कृष्णमेघांची मोठी लाट आडकिल्ल्यावरुन वेगाने आमच्यादिशेने येत होती..


















काही मार्ग :
१. नाशिक - सिन्नर - डुबेरे - ठाणगाव - पट्टेवाडी
२. नाशिक - देवळाली - भगूर - लहवीत - शेणीत - साकुरे फाटा - टाकेद बुद्रुक - पट्टेवाडी
३. नाशिक - वाडीवर्‍हे - अस्वली - साकुरे फाटा - पट्टेवाडी
४. नाशिक - घोटी - (घोटी - शिर्डी मार्गाने) धामणगाव - भंडारदरावडी
५. नाशिक - देवळाली - भगूर - पांढूर्ली - शिवडे - सोनांबे - आडवाडी - हिवारे - पट्टेवाडी
६. नाशिक - देवळाली - भगूर - पांढूर्ली - घोटी-शिर्डी रस्त्याने बेलू फाटा - बेलू - निनावी - भंडारदरावाडी फाटा - अडसरे - टाकेद बुद्रूक (टाकूद टाळून थेट घाटाकडे कच्च्या रस्त्याने - म्हैसवळण घाट - पट्टेवाडी




इतिहास :






पहाण्याची ठिकाणे :
पट्टावाडीतून किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत पक्का डांबरी रस्ता झालेला आहे. रस्त्याच्या शेवटी वन खात्याने चौकी उभारलेली आहे. प्रौढांसाठी रुपये ५/- भरुन आणि नाव पत्ता नोंदवुन किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ला चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला एका चौथर्‍यावर हत्तीण व तीची दोन पिल्ल अस फ़ायबर मधे बनवलेल शिल्प बसवलेल आहे. थोडा चढ चढुन गेल्यावर पायर्‍या लागतात. वनखात्याने पायर्‍या व्यवस्थित बांधलेल्या आहेत. पायर्‍यांच्या वाटेने वर चढतांना दोनही बाजूचा कातळ छिन्नी - हातोड्याने तासून गुळगुळीत केलेला दिसतो. जिथे कातळ उपलब्ध नव्हता अशी जागा बांधुन काढलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. पायर्‍यांच्या वाटेने वर आल्यावर एक चौकोनी गुहा दिसते . रांगत जाता येईल एवढीच या गुहेची उंची आहे. हि गुहा सध्या बुजलेली आहे. या गुहेत पाण्याचे टाक असावे. हि गुहा पासून पायर्‍यांच्या वाटेने वर गेल्यावर डावीकडे दोन गुहा लागतात. यातील एका गुहेमध्ये साधूचे वास्तव्य होते, ती गुहा सध्या कुलुप लावून बंद केलेली आहे. बाजूची दुसरी छोटी गुहा उघडी असल्याने पाहायला मिळते. उजव्या बाजुलाही दोन गुहा आहेत. त्यातील मोठी गुहा सुध्दा कुलुप लाउन बंद केलेली आहे. दुसरी गुहा उघडी असुन गुहेत राहाता येते. गुहेच्या समोर मोठी पत्र्याची शेड टाकलेली आहे. त्यात २५ ते ३० जण आरामात राहु शकतात.

गुहां जवळून जाणार्‍या पायर्‍या चढून वर गेल्यावर उजवीकडे उत्तरमुखी त्रिंबक प्रवेशव्दार दिसते. त्याची कमान आजही शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला बुरूज आहे. येथून एक वाट पट्टावाडीत उतरते.


प्रवेशव्दार पाहून परत वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. येथे एक सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यापासून वर चढत गेल्यावर अष्टभुजा पट्टा देवीचे मंदिर लागते. या मंदिराचा अलीकडेच जीर्णोध्दार केलेला आहे. मंदिरा समोरून पुढे जाउन उजव्या बाजूने वर चढत गेल्यावर आपण एका प्रशस्त इमारतीपाशी येतो. या इमारतीला "अंबरखाना" म्हणतात. या इमारतीची बांधणी काळ्या घडीव दगडात केलेली असून आत प्रशस्त दालन आहेत. इमारतीचे छ्त घुमटाकार आहे. अंबरखान्याची वनखात्याने डागडुजी केलेली असून आत मधे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. अंबरखान्या भोवती बगिचा फ़ुलवलेला आहे.

अंबरखाना पाहुन झाल्यावर किल्ल्यावरील अवशेष पाहाण्यासाठी अंबरखान्याच्या मागे जाउन वरच्या दिशेने चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावरून उजव्या बाजुला दूरवर औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो.

या पठारावर उजव्या बाजूला (औंढा किल्ल्याच्या दिशेला) गेल्यावर प्रथम पाण्याची दोन मोठी टाकी लागतात. त्याच्या पुढे सुकलेल टाक आहे. पुढे गेल्यावर एक गुहा लागते. गुहेचे ओसरी आणि दालन असे दोन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली असुन दालन चार खांबांवर तोललेल आहे. गुहांच्या पुढे गेल्यावर ओळीत खोदलेली पाण्याची ७ टाकी दिसतात. पुढे गेल्यावर अजुन एक गुहा पाहायला मिळते. या गुहेच वैशिष्ट्य महणजे त्याच्या बाहेरच्या बाजुला जमिनीवर कातळात खोदलेले धान्य कोठार आहे. या धान्य कोठाराच्या दोन खिडक्या पाहायला मिळतात. गुहेच्या पुढे चालत गेल्यावर एकामागोमाग एक अशी पाण्याची १२ टाकी पाहायला मिळतात. त्यांना "बारा टाकी" म्हणून ओळखतात. यातील शेवटच्या टाक्याच्या मागे कातळात कोरलेली गुहा आहे. बारा टाक्यातला गाळ वनखात्याने उपसलेला असुन त्यावर वृक्षारोपण केलेल आहे. बाराटाकी पाहुन पायवाटेने खालच्या बाजुला उतरल्यावर एक पाण्याच टाक पाहायला मिळत. हे टाक पाहुन औंढा किल्ल्याच्या दिशेने सरळ जाणार्‍या वाटेने ५ मिनिटे चालल्यावर आपण दिल्ली दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाची कमान उध्वस्त झालेली आहे. दरवाजाच्या बाजुला बुरुज आहेत. दरवाजापासून किल्ल्याच्या खालच्या अंगाला गेलेली तटबंदी ढासळलेली आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजुला पाण्याच टाक आहे. येथुन पुढे जाणार्‍या पायवाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते.


दरवाजा पाहुन आल्या मार्गाने परत फ़िरुन अंबरखान्या पर्य़ंत येऊन डावीकडे गेल्यावर काही वास्तूंचे अवशेष दिसतात. पुढे शिवकालिन बांधारा पाहायला मिळतो. गडाच्या डाव्या टोकावर भव्य बुरुज आहे. हा बुरुज आपल्याला किल्ल्याच्या पायर्‍या चढतांना डाव्या बाजूस दिसलेला असतो. हा बुरूज पाहून खाली उतरणार्‍या वाटेने आपण पट्टादेवीच्या मंदिरापाशी येतो. तेथे आपली गड फेरी पूर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास २ ते ३ तास लागतात. 












काही अवधीतच आम्ही तेथील प्रसिद्ध लक्ष्मणस्वामी यांची समाधी असलेल्या गुहेजवळ पोहोचलो.. दर पौर्णिमेला दरवाजा उघडला जातो असे त्या गुहेच्या बंद दरवाज्यावर लिहीले होते.. या परिसरात माकडांची भली मोठी फौज धुमाकूळ घालत असल्याने आम्ही तिथे न थांबताच वरती सरकलो.. वाटेत अधुनमधुन लागणार्‍या कोरलेल्या पायर्‍या असोत वा खडकाचाच आधार घेउन आजही खंबीरपणे उभ्या असलेल्या तटबंदीच्या भिंती असोत.. किल्ल्याते अस्तित्व चढताना जाणवतेच..
गडावरची गुहा :

– –
अजस्त्र कातळ भिंत व तटबंदी

काही अंतरावरच आणखी एक गुहा लागली जिथे देवीच्या मुर्ती आहेत.. मुक्कामासाठी गुहा छान.. पुढेच उजवीकडे अजुनही भक्कम स्थितीत असलेला उत्तरमुखी दरवाजा (दिल्ली दरवाजा) आपल्याला साद घालतो.. सुस्थितीत असलेली सुंदर कमान हीच खरी या दरवाज्याची शान आहे.. येथील बुरुजावरुन अगदी आडकिल्ल्यापासून सुरु झालेली वाटचाल नजरेस पडते.. अजुन वरच्या बाजूस चढून गेलो तर पटटाई देवीच्या मंदीराचे जीर्णोद्धाचे बांधकाम सुरु असल्याचे दिसले.. बाजूलाच पिण्याच्या पाण्याची टाकीदेखील आहे..
उत्तरमुखी दरवाजा

या गडावर अगदी सुस्थितीत असलेले किल्ल्याचे अवशेष म्हणजे अंबारखाना जो मंदीराच्या पुढे वरती गेलो की नजरेस पडतो.. आम्ही अंबारखानाच्या दिशेने चढू लागलो तोच वातावरणात अचानक बदल झाला.. जोरकस वार्‍याने प्रवेश केला.. मागे वळून पाहिले तर कृष्णमेघांची मोठी लाट आडकिल्ल्यावरुन वेगाने आमच्यादिशेने येत होती..
पावसाची सर आली तर आमचे कॅमेरे धोक्यात होते तेव्हा पुढे जायचे की मागे मंदीरात जाऊन थांबायचे हा प्रश्न पडला.. पण ती लाट एक- दोनच थेंब पाडून आमच्या डोक्यावरुन पुढे सरकली नि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला.. अंबारखान्यापाशी जाताच समोरच शिवरायांचा अर्धपुतळा नि त्यांचा शिरावरती फडफडणारा जरीपटका पाहून अंगात स्फूरण चढले.. जालन्याची लूट केल्यानंतर महाराज याच गडावर काही काळ विश्रांतीसाठी थांबले होते व याच घटनेमुळे ‘पटटागड नंतर विश्रामगड’ म्हणून ओळखू जाउ लागला.. !
– –
तीन घुमटयांचे छत असलेला हा अंबारखाना आतून बर्‍यापैंकी प्रशस्त. आतील कमानी, भिंती इति सारे बांधकाम अजुनही तग धरुन आहे हेच आपले भाग्य समजावे..

या अंबरखान्यापासून काही अंतरावरच पाण्याची मोठी टाकी आहे.. आम्ही आता सरळ माथ्यावर चढत जाणारी वाट पकडली.. माथ्यावर पोहोचलो नि मन हरपून गेले.. दृश्यच तसे होते.. आकाशात कृष्णमेघांचा उसळलेला समुद्र.. त्यातूनही सुर्यदेवांनी भूतलावर मारलेला टॉर्च.. वातावरणाला एक वेगळीच धुंदी चढली होती.. या धुंदीनेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजेच कळसुबाई व ट्रेकर्सलोकांमध्ये उंचीचे स्थान मिळवणारे ‘अलंग-मदन-कुलंग’ हे दुर्गत्रिकुट या डोंगररांगेला एक आगळाच साज चढला होता…. आम्ही मात्र पुरते बेहोश होउन गेलो होतो.. कॅमेरे थकले.. शेवटी डोळ्यांनीच तो निसर्गाविष्कार निरखू लागलो.. खरच निसर्गाचे असे खेळ सुरुच असतात फक्त ते दिसले पाहीजेत.. त्यासाठी अश्या उंच ठिकाणी येउन तासनतास बसले पाहीजे.. हाच भाग्याचा दिवस होता कारण वारंवार ट्रेक करुनही असे नशिब क्वचितच फळफळते.. ! मग अश्या आठवणीच हृदयाच्या कप्प्यात कायमच्या कोरल्या जातात..
पटटयाच्या माथ्यावरील सर्वोच्च शेंडयापर्यंत चढेपर्यंत नभापटलावरची रणधुमाळी अकस्मात थंडावली होती.. कृष्णमेघांच्या समुद्राला पश्चिमेचे क्षितीज गिळण्यात अपयश आले होते.. आता दिसणारे दृश्य अगदी स्थिरचित्राप्रमाणे भासत होते..

– –
पटटयाचे सर्वोच्च टोक
या शेंडयावरुन आमच्या नजरेची लेन्स मात्र चोहीदिशेने वळत होती.. आजोबापासून अलंग-मदन-कुलंगपर्यंत तर पलिकडे टोकाला इगतपुरीचा त्रिंगलवाडीदेखिल नजरेस पडत होता..भोवतालचा सारा परिसर नजरेत ठेवता येत असल्याने ह्या किल्ल्याला नक्कीच महत्त्वाचे स्थान मानले जात असावे..
– – –
औंढ किल्ल्याकडे जाणारी वाट

घटकाभर विसावल्यानंतर आम्ही जेमतेम अर्ध्यातासात पायथा गाठला तो अगदी समाधानपुर्ती भावनेने.. ज्यासाठी अटटाहास करतो ते उद्दीष्ट साध्य झाले होते

पट्टा गडावर आजवर बर्‍याच भेटी झाल्या आहेत. या भेटीत गौरी फुलांचे जांभळे, गुलाबी डोंगरकडे बघण्याशिवाय दुसरे काही प्रयोजन नव्हते. या हंगामात पट्ट्या इतका तेरडा अन्यत्र कुठेच नसावा. यंदा जुलैच्या महिन्यात झालेल्या भेटीत आकंठ फोफावलेला तेरडा बघायला मिळाला होता. तेव्हाच ठरवले होते, याचा बहर बघायचा! गणपतीच्या आसपास तो बहरतो त्यामुळे ऋषीपंचमीच्या बेताला पट्ट्यावर खास तेरडा भटकंतीसाठी जाण्याचा मनोदय होता. गणपतीत कोणाचा काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे ऐन बहरातली भटकंती होता होता राहून गेली. एकतर हे पावसाळी झुडूप. त्याचा बहर पावसाळा संपताना संपुन जातो. यंदा पाऊस लांबल्यामुळे आम्ही नशिब आजमावण्याचे ठरवले. तिथला वाटाड्या भरत निसरडचा दूरभाष संपर्क होत नव्हता. पट्ट्यावरची नेमकी स्थिती समजत नव्हती. काही तरी वेगळे नक्की पहायला मिळेल. ही आशा मनात पक्की होती.
भाद्रपदात सगळा आसमंत हिरवा शालू पांघरलेला असतो. आकाश निरभ्र होऊ लागते. उन्हे दिसू लागतात. त्यांच्या उर्जेने असंख्य फुले उमलतात. फुलपाखरे, पक्षी, किटक अशी सृष्टी बहरात येते. दूरवरच्या डोंगररांगा न्याहाळता येतात. निळ्या आकाशावर पांढर्‍या ढगांचे डोंगरच्या डोंगर तयार होतात. मग ते एकमेकांशी स्पर्धा करतात. काही इकडून तिकडे तर काही विरोधी दिशेने येऊन आकाशतला हा खेळ भान हरपून बघायचा तो एखाद्या डोंगर परिसरातच.
२९ सप्टेंबर, रविवारची सुटी असल्यामुळे मला अधिकृतरित्या भटकंतीला जाण्यास घरातून आडकाठी येणार नव्हती. त्यातच सूर्य प्रसन्न झाला. सौभाग्यवतींनी सांगितले: जीव घाबराघुबरा होतोय. अन्न गोड लागत नाही. पाण्याची चव कळत नाही. पाठ आणि पाय तर सारखे दुखत आहेत. यापूर्वी शहरातल्या काही डॉक्टर्सचे उंबरठे झिजवून झाले होते, म्हटलं तुला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जातो.
शनिवारचा दिवस कामाचा कळस गाठणारा. रविवारच्या सुटीच्या अगोदरची कामे उरकायची असतात. त्यात आमच्या व्यवसायाचा हंगाम तोंडावरच आलेला. डोक्यावर कामांचा डोंगर उभा असताना भटकंती म्हणजे धाडसाचेच काम. पदरात अनपेक्षित दान पडावं तसं सौभाग्यतींच्या नव्याच आजाराचे दान पडले होते.
इथे येऊन थांबते...रस्ते बांधणी तंत्रज्ञान

जायचे कसे? 

काळी पिवळी करूया. त्यासाठी दहा ते बारा जण असावेत. आमचे सहाच जण होत होते. सुषमाने थार घेते असे सांगितले आणि मन थरारले. ट्रेकला कोणी थार घेणार असेल तर त्याला कधी नाही म्हणतात का? चारही चाके स्वतंत्रपणाने चालविण्याच्या तंत्रावर चालणार्‍या थार जीपने डोंगराचे अवघडात अवघड कडे चढता व उतरता येतात. भर नदीतून, चिखल ओहळीतून थार चालू शकते. हा लांभाश टाळणे शक्य नव्हते. तोच अमोल शिंदे सामिल झाले. आजवर त्याच्याशी केवळ गप्पा झाल्या होत्या. त्याचीही चारचाकी सज्ज होती. चार दोन गडी वाढले असते तरी गाड्यांचा बंदोबस्त झालेला होता.
सुषभा, विद्या, संगीता आणि डॉ. प्रिती या चार मैत्रिणी, अमोल शिंदे आणि परदेशी दाम्पत्य असा छोटा लवाजमा भल्या सकाळी मुंबई नाक्यावर नेहमीच्या किनारा हॉटेलजवळ जमणार होता. जाऊन बघतो तर काय, किनार्‍याचे नामोनिशाण नव्हते. इतकी वर्षे नाशिकची सांस्कृतीक ओळख बनलेले किनारा हॉटेल गेले कुठे. का मीच चुकलो. तिथे कुंपण दिसले. आत हिरवे शेत. एका बाजूला शेवाळलेला सिमेंटचा खांब पडलेला होता. त्यावर किनारा हे रंगवलेले नाव दिसले आणि खात्री पटली. आपण चुकलो नव्हतो. किनार्‍याचा काळ झाला होता.
नाशिकहून घोटी हे २१.४ मैल म्हणजे जवळपास ३४ किलो मिटरचे अंतर आमच्या थारने ४५ मिनीटात पार केले. वेग बेताचाच होता. आता परिक्षा सुरू झाली ती घोटी-शिर्डी मार्गाची. मुंबईहून शिर्डीला जाणार्‍या तसेच पुण्यास जाणार्‍या वाहतुकीचा या मार्गावर मोठा भार आहे. त्यातच स्थानिक वाहतूकीही बेसुमार वाढली आहे. ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा रस्ता बांधला ते इथल्या वातावरणात टिकणारे नाही, त्यामुळे थोड्याच काळात हा रस्ता जो खराब झाला तो दुरूस्त होण्याचे नावा घेईना. सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणने आहे की, सर्वोत्तम दर्जाच्या सिमेंट मिश्रणाचा वापर करूनही या रस्त्यावरचे खड्डे तग धरेनात, तेव्हा आता नव्या हरित तंत्रज्ञाचा वापर करून खड्डे भरण्यात येतील, त्यामुळे खड्डे लवकर उघडे पडणार नाहीत. अर्थात याचा मुहुर्त केव्हा उजाडणार.
भटकंतीसाठी अशी दणकट सोबत मिळणे भाग्याचे...
हा प्रयोग करून पहावा
थार असल्यामुळेच घोटी-टाकेद हे चाळीस किलो मिटरचे अंतर पार करताना फारसा त्रास जाणवला नाही, तथापी प्रत्येक खड्ड्यातून गाडी नेताना मागच्या बाजुला बसणार्‍यांची हाडेनहाडे वाजत होती. थार सारखे अतिशय दमदार वाहन असूनही या मार्गाने परतायचे नाही, असा निर्धार अर्धा तासाच्या मारानंतर पक्का झाला. रस्ता म्हटले की, चार दोन खड्डे स्वाभाविक. इथे तर एक खड्डा चुकवला की दुसरा पुढ्यात येऊन उभा. पावसाच्या प्रदेशात डोंगराळ भागात आपण रस्ते बांधू शकत नाही, हे मान्य करायला हवे. त्या ऐवजी रस्ते हे कच्चे मातीचे ठेवले तर वाहनांची आदळ आपट कमी होईल. त्यांचा घसारा फार होणार नाही. प्रवास करणार्‍यांना मोठमोठे दणके बसणार नाहीत. उलटपक्षी वाहतुकीचा वेग वाढू शकेल. किमान पाऊस नसेल तेव्हा तरी अशा कच्चा रस्त्यांचा लाभ हा खड्डे युक्त रस्तत्यांच्या तुलनेत कितीतरी मोठा असेल. हळूहळू हे कच्चे रस्ते मग रूळतील. चांगले मळतील. शेकडो टन वाहतूकीच्या वजनात तेही मग पक्के बनतील. हा कमी खर्चाचा पर्याय आजमावून बघावा का? अतिश्योक्ती नाही, हे सत्य आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विविध भागात राष्ट्रीय कार रॅली अजिंक्यपदाचे आयोजन करताना सर्वाधिक प्राधान्य पूर्णकच्च्या रस्त्यांना देतो. डोंगराळ, घाटांच्या मार्गावरून अतिशय वेगवान व साहसी गाडी दौडविणार्‍या स्पर्धकांची पसंती ही डांबरी रस्त्यापेक्षा कच्चा रस्त्याला असते. जागतिक कार रॅली अंजिंक्यपद स्पर्धा तर केवळ आणि केवळ कच्च्या रस्त्यांवरून आयोजित केली जाते.
करंजी नदीच्या किनार्‍यावर जुन्या पद्धतीने दगड काढण्यात आल्याच्या खुणा ...

स्वच्छ सुंदर खळाळती करंजी
वाटेत चहा नाश्ता घेण्यासाठी थांबायचे नाही असे नियोजन केले होते. सोबत पुरेसा नाश्ता घरून बनवून घेतला होता. टाकेद ओलांडून म्हैसवळण घाटाच्या सुरूवातीला बितंग्यावरून येणार्‍या करंजी नदीचा खळाळता शुभ्र प्रवाह पुढे जाऊ देईना. नदीकाठच्या खडकावर सकाळच्या उन्हात न्याहारी घेण्यासाठी याहून अधिक चांगली जागा असूच शकत नव्हती. या ठिकाणहून जुन्या पद्दतीने दगड काढल्याच्या खुणा दिसत होत्या. जवळच टाकेदचे रामायण कालिन जटायू मंदिर असल्याने करंजी काठचा दगड त्याकरिता वापरला गेला असण्याची शक्यता आहे. इथून दगड अतिशय योजनाबद्द पद्धतीने बरोबर चौकानात कापून नेला आहे. काय तंत्रज्ञान असेल त्यावेळचे. ना कुठल्या यंत्राचा वापर ना विस्फोटकांचा. आश्चर्य याचे की, इतका कमी दगड का काढला असेल. की नंतरच्या टप्प्यात एखाद्या लहान कामासाठी इथून दगड काढून नेला असेल.
याठिकाणी नदी काठी घाण अजिबात नव्हती. गावालगत नदीकाठी सहसा केशवपन करण्याची जागा दिसते. निसर्गरम्य ठिकाण म्हणून लोक फिरायला येतात व कचरारूपी खुणा ठेवून जातात. इथे यापैकी काहीच नव्हते. अशी छान स्वच्छता ठेवण्याची बुद्धी केवढी चांगली गोष्ट.
म्हैसवळण घाट टाकेद बुद्रूकवरून
म्हैसवळण घाट
लहानसा म्हैसवळण घाट चढत असताना पश्चिमेला इगतपूरी-अंजनेरी-त्र्यंबकेश्वरची डोंगररांग सुस्पष्ट दिसत होती. निळ्या आकाशावर पांढरे ढगांचे पुंजके आणि त्यातून डोंकावणारे असंख्य परिचीत असे डोंगर. अगदी सूदूरचा उतवड्या सुद्धा ओळखू येत होता. त्र्यंबक रांगेतला हा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात उंचा असा किल्ला.
घाटातल्या नाना कलांनी नटलेल्या हिरवाईतून या डोंगरांगांचे दर्शन वेड लावणारे होते. एकेठिकाणी गायवाटांची हिरवी नक्षी लक्षवेधी ठरत होती. हिरव्या कंच पार्श्वभूमीवर इवलीशी पिवळी फुले कुण्या चित्रकाराने हलके पिवळे शिंतोडे उडवल्यागत भासत होती. थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले की, हिरव्या मखमली डोंगरकड्यांवर शेकड्यांनी पिवळे गवतफुलांचे पुंजकेच्या पुंजके बहरले आहेत. आम्ही आलो होतो तेरड्याचा बहर बघायला. या पिवळ्या ठिपक्यांनी हा वेगळाच अनपेक्षित लाभ मिळवून दिले. काही ठिकाणी ही पिवळी फुले इतकी अधिक होती की, त्यामुळे गच्च हिरव्या डोंगरकड्यांना पिवळी छटा आल्यागत भासत होते.
हिरवी मखमली गावयाटांची नक्षी
चकाकणारे हे पिवळे ठिपके आता आम्हाला अडकवू पाहत होते. त्यात अडकायचे नाही, आपले उद्दीष्ट आहे तेरड्याचा जांभळा बहर आणि तोही पट्टा उर्फ विश्रामगडावर. वेळ न दवडता, एक दोन ठिकाणी थांबलो ते पुरे असे मनाला बजावत आम्ही जसजसे पुढे जात होतो, तसतशी पिवळ्या गवतफुलांची नक्षी बदलत होती. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा त्यांची जणू रांगोळी पसरली होती. आमच्या स्वागतासाठी निसर्ग असा सजून सज्ज होता आणि आम्ही मात्र त्याला टाळून पुढे जाण्याचा विचार करत होतो.
सुमन आजी: त्या बोलायला लागल्या की पाय निघता निघत नाही...
चैतन्याचा खळाळता झरा
सगळेच अनूभवी भटके असले तरी सोबत महिला मंडळ असल्यामुळे स्वैर स्वंच्छंदी भटकंतीचा विचार सुद्धा मनात नव्हता. अंधार दाटण्याच्या आत घरी परतायचे हे उद्दीष्ट ठरविण्यात आल्याने त्या स्वागत सोहळ्याकडे चक्क कानाडोळा करून आम्ही पट्टेवाडी गाठली. तिथे सुरूवातीलाच असलेल्या भरत निसरड यांच्या घरात आवाज दिला तर भरत चक्क हजर दिसला. दोघींना उपवास असल्याने त्याला पाच जणांचे जेवण बनवून ठेवायला सांगून आम्ही विश्रामगडाचा पायथा गाठला. समोर चैतन्याचा खळाळता झरा हजरच होता.
सुमन महादू जाधव यांनी बरोबर ओळखले, 'मागच्यावेळी तुम्ही त्या झाडाखाली फोटू काढत व्हता. लई छान वाटलेरे पोरांना परत आला, जा...वर जाऊन या..माकडं थोडा तरास देशाल...पन तुम्ही घाबरू नका...जा सांभाळून जा...'
असा जा...जा...सांगणार्‍या सुमन आजींचे बोलणे थोडेच थांबते. त्यांच्या चेहर्‍यावरचे चैतन्य थोडेच कमी होते. पुन्हा माघारी आल्या आणि एक छानसा रामकथेतला प्रसंग त्यांनी रसभरल्या गाण्यातुन उलगडला. अंजनेरी, आजोबा, हरिश्चंद्रगड अशा सगळ्या टापूत इथल्या मुळनिवासींच्या गाण्यात रामायणाच्या कथा झळकल्याचे वेगवेगळ्या भटकंतीत अनूभवायला मिळाले आहे. रामायणाचा या भागाशी फार जुना संबंध असावा याचे ते द्योतक. अन्यथा या परिसरात रामकथा फारशा होत नाहीत. यांना रामायण कोणी शिकवत नाही. ते तर त्यांच्या रक्तातच. पिढ्यान पिढ्यांचे संस्कार.
पिढीजात ही गाणी त्यांच्या सोबत आली आहेत याची प्रचिती येते. सुमन आजींच्या गाण्यात आवंढा, पट्टा ही किल्ल्यांची नावे आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे कथन ऐकून अंगभर शहरे उठत होते. दहा एक मिनीटे खिळवून ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला जाऊ दिले.
गड चढतानाच जाणवत होते, तेरडा जळालाय...भादव्या पर्यंत त्यांची जीवनक्रमणा तशीही संपायला येते...

तेरडा अनं निराशा
वनखात्याची माणशी ५/-रूपये प्रवेश रक्कम भरली. पुस्तकात नाव गाव गाडी दुरध्वनी क्रमांक लिहून आम्ही लागोलाग गड चढू लागलो. गड हिरवा कंच दिसत होता, पण हे काय? तेरड्याने फुललेल्या कड्यांचे काय झाले. कड्यांच्या जांभळ्या गुलाबी छटा का दिसत नव्हत्या. काही मिटर चालल्याबरोबरच आपला कालक्रम पुर्णकरून अर्धामुर्धा कोमेजलेला तेरडा, तुम्ही अंमळ उशिर केला असे ओरडून सांगत होता. या डोंगरावर सर्वत्र इतका भरभरून उगवलेला तेरडा ऐन बहरात डोंगराचे काय सुंदर रूप सजवत असेल. केवळ कल्पनेतच हे चित्र उभे केले जाऊ शकत होते. ज्यासाठी आलो, तो तेरड्याचा बहर संपलेला होता. आता पुढ्यात काय राहील? निराशा?
तेरडा...गौरी फुले म्हणजे लढण्याचे प्रतिक...सौंदर्याचे प्रतिक...सह्याद्रीचा मान!
वरच्या टप्प्यावर पट्टाई देवीचे मंदिर बघून मन पुन्हा एकवार हिरमुसलो. प्रत्येक भेटीत मंदिराचे हे रूप डोकं चक्रावणार हे नक्की. गडावरचे मुळ दगडातले मंदिर पाडून भडक रंगातले, सिमेंट कॉंक्रिटमध्ये तयार केलेले हे आजच्या पद्धतीतलेमंदिर. त्याच्या तळाच्या चकाकणार्‍या लाद्या गडाच्या प्राचीन सौदर्याशी आंणि इथल्या एकुणच निसर्गाशी कुठेच मेळ साधत नव्हत्या. देवीच्या जुन्या शेंदूर चर्चित मुर्ती बाजुला बसवून नविन सिमेंट कॉंक्रिटच्या मुर्ती बसविण्यात आल्या आहेत. त्यांना अर्थातच ऑईल पेंटचे रंग. नाही म्हणायला त्र्यंबक दरवाजा जवळ थोडा वेळ रेंगाळलो आणि आम्ही राणी महाल नावाने ओळखल्या जाणार्‍या वरच्या टप्प्याकडे प्रस्थान केले.
गवताचा वाळेक्या पिसार्‍याच्या लाटा...त्याची मोत्यांमखमलाची झळाळी खिळवून ठेवत होती...
गवत लाटा...
तिथे बसवलेल्या लोखंडी नळकांड्यांच्या कठड्यांचे कोडकौतूक करत असताना समोरचे दृष्य खिळवून ठेवणारे होते. तेरडा संपला होता. त्याजागी उगवलेल्या गवताला सुकलेला करड्या रंगाचा मोहोर दिसत होता. वार्‍याच्या सोबत हा मोहोर लाटांसारखा भासत होता. अक्षरश: मखमली लाटा. क्षणाक्षणाला रंग बदलणार्‍या. रंगही साधे सुधे नाही. मोत्यांच्या सारखे. हाय रामा! हे केवढे सुंदर आहे. तेरडा नाही तर त्याच्या जागी पिवळी गवत फुले आणि आता ह्या गवताच्या मोतीदार छटांच्या मनोहारी लाटांनी आजची भटकंती सार्थकी लावली.
राणी महालाचा जुना बाज संपल्यात जमा आहे. याठिकाणी एक नव्हे तर दोन दोन मेघडंबरी बसविण्यात आली आहे. एक बाहेर तर दुसरी आत. आतिल भागातल्या मेघडंबरी समोर शिवराज्यभिषेकाचे दृष्य वेगवेगळ्या फायबरच्या पुतळ्यांनी साकारले आहे. शिवाजी राजांच्या दरबाराचा देखावा एका चिंचोळ्या जागात कुलुपात बंद अवस्थेत.

राणी महालाच्या भोवताली सर्वत्र तेरडा फुलेला. या संपुर्ण परिसराला जाळीचे कुंपण बसविण्या आले आहे. कुणाच्या डोक्यातून ही आईडियाची कल्पना आली असेल? येथे
फार काळ न रेंगाळता आम्ही शिखराच्या दिशेने कुच केली. शिखराच्या खालच्या भागात विस्तृत पठार सुंदर विविधरंगी फुलांनी बहरले होते. हिरव्या मखमली शिखरावर ढगांचा हलका मुकुट धरला होता. त्याच्या थोड्या भागावरच सूर्याची किरणे दिसत होती. हे दृष्य अनोखे. बराच वेळ खिळंवून ठेवणारे.
अबब ६ फुटी तेरडा
थेट शिखराकडे न जाता वाटेतले दोन तलाव, पुरातन टाकी आणि त्यांना सजवणारी फुले असा आमचा स्वर्गीय प्रवास सुरू होता. पहिल्या गुहेकडे जाताना तेरडा पुरूष सहज बुडेल असा साडे सहा सात फुट उंचीचा लागला. तेरड्याचे अभ्यासक तो तीन चार फुट वाढतो असे सांगतात. इथेही अफाट उंची चक्रावणारी. त्याचा बहर संपलेला. त्याची उंची हाच कौतुकाचा विषय.
अस्वच्छ लेणी
इथून औंढ्याच्या दिशेने चालत गेल्यावर दुसरी कातळ खोदीव गुहा लागते. या गुहेच्या वाटा अद्याप मळलेल्या नव्हत्या. आमच्या जाण्याने वाटा मळणार होत्या. त्याकरिता पावला इतके गवत तुडवणे हे आलेच. मन कचरत होते. पण पाऊस संपण्याच्या बेतात असल्याने लोकांची येथे ये-जा वाढेल तशा या वाटा अधिक ठळक होतील. आम्ही मुद्दाम छायाचित्र घेण्यासाठी किंवा जवळचा मार्ग काढण्यासाठी गवत वा फुलांचे ताटवे तुडवले जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेत होतो. त्यात खरे तर अधिक समाधान होते. या दुसर्‍या विशाल लेणीमध्ये काही भूमिगत धान्य कोठारे दिसत होती. या लेणीत माणसांच्या सोबत कठिण हवामानात जनावारेही बांधली जात असावीत. कदाचित घोडे. दगडात तशा खाचा आढळतात.
लेणी अर्थातच कमालीच्या अस्वच्छ. तिथली घाण साफ करणारी कुठलीच यंत्रणा आजच्या महाराष्ट्रात नाही. येथे ट्रेकर मंडळींचा फार राबता नाही. शासकीय पातळीवर तर तसे कोणतेच प्रयत्न कुठल्याच गडावर बघायला मिळत नाही, ते इथे कसे मिळणार. गडविकास निधी फायबर, सिेंमेंट कॉंक्रिटचे काम करण्यावर. तिथे अल्पजिवी ठरणारे आणि एकुण गडसौंदर्याला बाधा पोहचविणारे लोखंडा नळकांड्यांचे कठडे लावण्यापेक्षा लेणी, गुहा, मंदिरे स्वच्छ करण्यावर केला जाऊ शकतो. गडाच्या वाटा आजच्या बांधकाम पद्धतीने बांधून न काढता तिथलेच लहान दगड दुतर्फा बसविले आणि चिखल, माती, खाचा दगडगोट्यांनी बुजविल्यातर प्रचलित मार्गावरच्या छान पायवाटा तयार होऊ शकतील. त्यामुळे लोक गडफेरी करताना चुकणार नाहीत. गवत फुलांचे ताटवे तुडविले जाणार नाहीत आणि हे सगळे लाभ अत्यल्प पैशात मिळविले जाऊ शकतील.
बारा टाक्यांची हिरवी ऐट!
बारा टाके
आता बारा टाके शोधण्याचे आव्हान होते. त्यासाठी दाट गवतात पुसट झालेल्या जुन्या पाऊलवाटा शोधत एकदाच्या बारा टाक्या गाठल्या. येथे निळ्या, पांढर्‍या फुलांसोबत टोपली कारवीचे गच्च दाट ताटवे दिसत होते. बारा टाक्यांच्या शेवटच्या भागातली गुहा  अशीच गच्च दाट गवत, कारवीने बहरली होती. इथून दूरवर आवंढा किल्ला दिस होता. त्याच्या मधोमध एक जुनी भिंत. आजवर कुठल्याच भेटीत ही भिंत बघण्याचा योग आला नव्हता तो आज साधण्याचा निर्धार केला. आव्हान अर्थातच वाटा शोधण्याचे. अधून मधून दाटणार्‍या ढगातून आणि निसरडड्या वाटांतून चालत जाण्याचे होते. समोरचे कित्येक पिवळ्याफुलांचे ताटवे तिथे जाण्याचे अमिष बनून उभे होते. अर्थात औढा किल्ल्याचे विशाल रूप तिथून अधिक चांगले निरखता येणार होते.
बारा टाक्यांपासून तटाची भिंत बरीच लांब दिसत होती. औढा आणि पट्टा यांच्यात एखादी दरी असावी आणि त्यावर पट्ट्यांची स्वतंत्र संरक्षण सज्जता म्हणून ही भिंत उभी केली असावी असे या ठिकाणहून भासत होते. या मोसमात या वाटेवरून कोणीच गेले नव्हते. त्यामुळे गच्च दाट गवतातून पुसटशा पाउलवाटा शोधताना चांगली कसरत होत होती. जसजसे पुढे जात होतो, तसतसा औढा किल्ला अधिक मोठा भासत होता. उन्हं अधूनमधून डोकावून जात होती. त्यांच्या लखलखाटात पिवळ्या फुलांचा बहर अधिकच सुखावत होता. आकाश निरभ्र असले तरी सगळ्या डांगरांचे माथे ढगांचे मुकुट धारण करून होते. त्यामुळे बितनगड, कळसुबाइ, अलंग-मदन-कुलंग, दूरवरचे हरिश्चंद्र-तारामती आदी कुठलेच डोंगर ओळखण्याची संधी मिळत नव्हती.

दिल्ली दरवाजा...मुगलाईतले नाव...आपल्या राजवटीत याचे नाव काय असेल!
दिल्ली दरवाजा
तटाची भलीमोठी भिंत आता अदृष्य झाली होती. उत्तर बाजूचा कडा उतरताना अचानक भिंत दृष्टीस पडली. आम्ही ती ओलांडून त्याच्या पुढच्या बाजूला आलो होतो. तटाचे दोन बुरूज आणि त्यामध्ये दरवाजाचे भग्नावशेष. हाच तो दिल्ली दरवाजा. येथे पाण्याचे मोठे टाके दृष्टीस पडले. नेहमी पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असणारा हा परिसर निर्जन आणि तितकाच जुन्या काळाशी नाते सांगणारा. या तटाच्या दरीकडच्या टोकाच्या बुरजा पर्यंत जाऊन आमची भटकंती खर्‍या अर्थाने सार्थकी लागली.
या गडाचा इतिहास बहामनी, निझाम, आदिलशाही, मोगल, मराठे, पेशवे, इंग्रज असा वेगवेगळ्या राजवटींशी जोडला जातो. बहामनींच्या अगोदर गडाला मोठा इतिहास असावा हे इथल्या नक्षीदार भग्न मंदिराच्या अवशेषांवरून वाटते. त्याकरिता गडविकासाची निम्मा अधिक निधी हा गडावर उत्खनन व अभ्यासकांना ऐसिहासिक संशोधनासाठी उपलब्ध करून द्यायला हवा. म्हणजे कळेल हा गड पडक्या तटाभिंतींची बिन इतिहासाची वास्तू नाही. याचा इतिहास तर भारताच्या सुवर्णकाळाशी नाते सांगणारा.

दिल्ली दरवाजाचे तट कललेत...पण त्यांची मजबूती जमिन पकडूनच...काय अजोड बांधकाम!
घड्याळात दिड वाजले होते. परतीची नवी वाट शोधायची होती. खाली कड्यालगतचा निसरडा रस्ता टाळण्यासाठी एक छोटीशी चढण पार करून पुन्हा वरच्या पठारावरून वाटेचा शोध सुरू केला. पिवळ्या गवत फुलांच्या ताटव्यातून एक मोठा टप्पा पार करायचा होता. शिखरमाथा जवळच असूनही वेळेअभावी तो गाठता येणार नव्हता. या मार्गावर आणखी एक जुने कातळातले पाण्याचे टाके लागले. त्याच्या पुढे दगडात अनेक गोल छिद्रे मुद्दाम कोरल्यासारखी भासत होती. त्यात साठलेले पाणी आरसपानी भासत होते. जणू काही कोणी तरी मुद्दाम त्यात फुल झाडे लावली होती. निळ्या मंजिरी सारखी शेकडो मंद लाल गुलाबी फुले या छिद्रातल्या लहाल कुंड्या सजवित होते.
एक मोठा फेरा पार करून पायथ्याला वाहन तळ गाठले. तिथे सुमन आजींचे आणखी एक पौराणिक गाणे. पंधरा एक मिनीटे गप्पा झाल्यावर त्यांनी पायथ्याला असलेली शिवकालीन विहीर, शिवमंदिर बघून घ्या असे सूचविले. तु्म्हाला निंबाळकरांची समाधी सापडणार नाही. गाडी नेणार असाल तर ती तिथे वळवता येईल का याचा विचार करा अशा सूचना दिल्या. मागे एक कार विहिरीच्या परिसरात अडकल्याचे त्यांनी सांगितले.अपघात

निर्जन एकांतातले भग्न शिवमंदिर आणि त्याच्या थोडे पुढे शिवकालिन विहीर छानशा भटकंतीचा आदर्शवत समारोप ठरल्या. येथे रस्ता संपतो. चारचाकी गाडी वळून घेणे तसे जिकिरीचे काम. आमची थार जीप असल्याने अशा कामात तरबेज असल्याने चिंता अशी नव्हती. थोडे खाली उतरून निंबाळकरांच्या समाधीचा अदमास लागतो का याची चाचपणी करत असताना वरून गलका एैकु आला. एक मोठा दगड उडून अमोलच्या दोन्ही पायांच्या नळ्यांना चाटून गेला. त्याला बरेच खरचटले.
झाले असे की, रस्ता सोडून कच्च्या उतारावर सुषमा काळजीपूर्वक जीप वळवत होती. चिखल मातीमुळे मागचे एक चाक वेगात फिरत होते. त्याने सगळी माती उडविल्यामुळे चाकाला पुढे जाण्यासाठी आधार मिळत नव्हता. गियर बदलताना गाडी मागे येत होती. तोच आमच्यापैकी कोणी तरी एक मोठा दगड लाऊन गाडीची घसरण थांबविण्याचा प्रयत्न केला. सुषमाला त्यांनी तसे सांगितले. पण सुषमा पर्यंत तो आवाज पोहोचला नसावा. तिने काळजी करू नका, असे सांगिलते. फोर व्हिलच्या गियरवर गाडी सहज वर येईल याचा तिला विश्वास होता. सुषमा म्हणजे नाशिकची पहिली प्रशिक्षीत गिर्यारोहक. अनेक सुळके, कातळ भिंती सर केलेल्या. गिर्यारोहणात सर्व प्रकारच्या सुरक्षेचे महत्व तिला पक्के ठाऊक.
फोर व्हिलचे गियर टाकल्यावर गाडीची खेचण्याची ताकद कैकपट वाढते. त्यामुळे तो पाच एक किलो वजनाचा भलामोठा दगड अचानकपणे हवेत उडऊन मागच्या बाजुस उभ्या असलेल्या अमोलच्या पायाच्या दिशेने उडाला. नशिब बलवत्तर की केवळ खरचटण्यावर निभावले. दगड मोठा असल्याने फार उडाला नाही, छोटा असतर तर? वर्मी बसला असता तर? अशा विचारांनी संकट थोडक्यात टळल्याचा सार्‍यांनी सुटकेचा निश्वास टाकला.   कल्पना करा, दगड थोडा छोटा असता...तो अधिक वर उडाला असता तर? परिणाम काय घडले असते? कल्पना शहारे आणणारी होती. अनवधानाने घडलेली असली तरी ती चुक आम्हाला भारी पडली असती. प्रत्येक जण चांगल्या भावनेतूनच खटपट करत होता. अशा खटपटी जीवावर बेतू शकतात याची कुणाल काहीच कल्पना नव्हती. कच्चा उतारावर गाडी वळविणे हा महत्वाचा भाग असतो. थार असल्याने निश्चींत होऊन चालणार नव्हते. आम्ही सगळ्यांनी अगोदर गाडी वळविण्याचे नीट नियोजन करायला हवे होते. एक छोटासा प्रश्न मोठे रूप घ्यायला वेळ लागत नाही. समाधीचा शोध नंतरही घेता आला असता. आमचा हा अनूभव कथन करण्याचा उद्देश एकच, भटकंतीवर असताना लहान लहान गोष्टीबद्दल काळजी घेण्याची आवश्यकता असते. गाफिल राहून चालत नाही. अपघात हा अपघातच असतो. तो काही सांगून येत नाही. महत्वाचे सोपस्कर पार पाडूनच भटकंती व्हायला हवी. सुरक्षिततेत कसूर काहीच कामाचा नाही. तुम्हीही भटकंतीच्या वेळी येणार्‍या कटू आठवणी कथन करत जा. त्यामुळे मागच्यांना सावध होता येते.

तेरडा
तेरडा ही वनस्पती बाल्समिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इंपॅटिएन्स बाल्समिना आहे. ती मूळची दक्षिण आशियाच्या भारत आणि म्यानमार देशांतील असून जगभर इंपॅटिएन्स प्रजातीच्या ८५०-१००० जाती आहेत. भारतात या प्रजातीतील सु.१५० जाती आढळतात. ही वनस्पती समुद्रसपाटीपासून सु.१५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात, वनांमध्ये झाडाझुडपांच्या खाली वाढलेली आढळते. महाराष्ट्रात ही पश्चिम घाट, कोकण व दख्खनच्या पठारी भागांत वाढलेली आढळते.
तेरडा ही ३०-९० सेंमी. उंच वाढते. खोड मांसल असून फांद्या आखूड असतात. पाने साधी, सु.१५ सेंमी. लांब व भाल्यासारखी निमुळती असतात. पानांची मांडणी सर्पिलाकार व कडा दंतूर असून त्यांच्या देठावर ग्रंथी असतात. फुले गुलाबी, एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत येतात. मात्र फुलांचे जांभळट, फिकट गुलाबी, तांबडे किंवा पांढरे असे प्रकारही असतात. परागण कीटकांमार्फत व पक्ष्यांमार्फत होते. बोंडे सु. एक सेंमी. जाड व लवदार असून त्यांना स्पर्श झाल्यास ती तडकून फुटतात. तेरड्याच्या पानांत नॅफ्थॅक्विनोन, लॉसोन व लॉसोन मिथिल ईथर असे मुख्य क्रियाशील घटक असतात. बियांमध्ये कॅम्फेरॉल (फ्लॅवनॉइड) हा मुख्य घटक असतो. काही देशांत मेंदीप्रमाणे तेरड्याच्या पानांनी व फुलांनी हात व नखे रंगवितात. फुले थंडावा देणारी असून ती भाजलेल्या जागी लावतात. आशियातील काही देशांत ही वनस्पती संधिवात, अस्थिभंग आणि बद्धकोष्ठता इत्यादी विकारांवर वापरतात. बियांपासून मिळणारे हिरवट व चिकट तेल स्वयंपाकात व दिव्यासाठी वापरतात. महाराष्ट्रात गौरीगणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पानेफुले वाहतात. म्हणून तेरड्याला गौरीची फुले असेही म्हणतात.
लेखक -खोत, सुधाकर सं.
स्त्रोत: कुमार विश्वकोश
This is Google's cache of 
आपली विशिष्ट प्रतिभा जपून ठेवणारे एक फुलझाड म्हणजे तेरडा.
म्हैसवळण घाटातून इगतपुरी अंजनेरी त्र्यंबकेश्वरच्या डोंगरांगांचे सुस्पष्ट दर्शन घडविण्यासाठी प्रसन्न झालेला सूर्यदेव


तेरडा पाच सहा फुटांचा...

तेरडा कार्वी सारखा पठार कडे व्यापून...



तेरड्या सोबत कुर्डुचे बेट...






औढा...मधोमध दिल्ली दरवाजाचे तट...

हा कोण माळी...जो गडावर पाषाणात कित्येक गोल खड्डे खोदतो...त्यात पाणी भरतो आणि आकंठ फुले फुलवतो


पिवळ्या गवतफुलांचीच सद्दी...

दिल्ली दरवाजा पर्यंत केलेली पायपीट अशा फुलांच्या वाटांमुळे सूसह्य!

बांधकामाचे सुंदर व अचूक नियोजन...दिल्ली दरवाजाचे तटाचे बांधकाम अवघड कड्यावर केलेत...

शेकडो वर्षे उलटूनही आपला सुबक बांधणीचा बाज मिरवणारी तटाची भिंत...

औढ्याच्या बाजूने दिल्ली दरवाजातून पट्ट्यात प्रवेश...

औढ्याला जोडणारे पट्टा गडाचे पठार...जुने टाके

अधून मधून ढग बाजूला सारून सूर्य या गवत फुलांना हसवत होता...

पट्ट्याचे शिखर ओलांडताच औढ्याचा सुंदर नजारा...

या गवतफुलांसाठीच तेरड्याने वाट करून दिली नसावी ना!

बारा टाकी परिसरात टोपली कारवाईचे गुच्छे!



हिरवाईच्या कित्येक छटा...त्यातून उलगडल्या वाटा...

टाक्यातही रंगाचा खेळ कधी पांढरे...कधी आकाशी...कधी हिरवे तर कधी राखाडी प्रतिबिंब...

तेरडा कुर्डुची दिलजमाई...

हताश: तेरड्याचा बहर बघण्यासाठी थोडा उशिरच झाला...


जुगलबंदी: सीतेच्या आसवांची गवत फुलांशी...

सीतेची आसवे याच पठारावर टपकली असतील...

कोणी तरी प्रकाश चमकवत होतं...शिखराचे दर्शन थोडं थोडं घडवत होतं...

भाद्रपदाच्या हिरवाईला निळ्या नभाची छटा...त्यावर पांढर्‍या मेघांच्या लाटा


वाटलं होतं दिसेल हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला...









फायबरमध्ये बनवलेला महादरवाजा

त्र्यंबकदरवाजा























Before I start with our trekking moments, Let us brush up a little history of this Patta fort.



Map of Patta Fort

History:
After the war at Jalna , Shivaji Maharaj reached Sangamner, Even though the moghuls who was chasing Shivaji with the large army they got defeated in the battle and on 16th Nov 1679(6 months before death) Shivaji Maharaj arrived on the fort and rested here for a month to recover from prolong illness hence the fort got it's name Vishramgad. This fort was earlier known as Patta killa. The residents of this fort was called Pattekar. 
Height of this fort is 1392 mtrs(4566 feets). 


The route from Takked village was immensely beautiful especially with curling roads. Lovely mountains towering over us, cool breeze, overcast black clouds threatening to simply burst forth 
and the icing on the cake was the sight of windmills dotted along the horizon looked just like beautiful candles on a birthday cake.



Windmills looking like candles on the cake
I don't know why we city people get so excited seeing the windmills(Obviously including myself). Mano ya na mano yaaro these windmills do have certain aura about them. The team with which I was traveling was not all that die hard fan of clicking pictures, therefore it took some efforts to convince them to have 5 minutes break at the spot where we could actually touch the windmills.


I have never seen windmills from so close

Before anyone could change their mind I jumped out of the jeep and started clicking madly, in the meanwhile others also got into the act, "Ek baar engine chalu kar do toh gaddi akshar bhagne lagti hai " I say this because the whole atmosphere went photo- photo for few minutes.


I am always ready for a picture
Ajay had to keep honking the horn of the jeep  to attract everyone's attention to come back to the jeep. Few more minutes of drive from here and we reached Pattewadi.The base village of the Patta Fort.


Base of Patta Fort

All through out this drive from Kasara station to Pattewadi we were gaining height , perhaps that was the reason that prompted me to jokingly thank Ajay that he has ensured our door delivery to the gates of the fort.

Arrival of the Team at the base

Jokes apart, upon reaching the Pattewadi base village we had almost covered the height of around 3500 fts. with only 500-600 fts. to trek.


Meanwhile the entrance of the Fort gate stood inviting us, to come and explore it. Before coming here , I did my research on the internet which confused me more by giving various options to reach this fort , some suggested Takked village route, some suggested Ninvi village route. But honestly speaking Pattewadi is the most simple and straight forward route. " Dimag ki bhatti jalao, Aur Kasara seedhe Pattewadi aajao." At the entrance of the gate I had my first brush with the winds of tourism doing rounds of Nasik region fort, yes they had a entry ticket counter, Adult Rs 5 and Children Rs 2. As I was in half  pants so I insisted for half  ticket , but  sorry to say  I was driven away. " kabhi kabhi lagta hai , duniya me sense of humour hai hi nahi. After purchasing the ticket we entered through the gate.


The first thing you notice is large newly fitted boards showing map of the fort and other information like before and after picture etc. just little ahead  you can see freshly painted set of Elephants statues.


Just behind them is a canon mounted on the wheels.Ab mai thehra adat se majboor  so I could not resist taking my pictures with the canon(Andar ki baat yeh hai secretly I always picture myself as a commander,commanding to fire on the enemies) Bas itna sa khwab hai.


After humoring myself with the battle cry, we started moving ahead. The first thing I noticed was this entry gate. A big eyesore, this darwaja reminded me of the crazy decor they put  up at Ganpati Mandal. What surprised me more was that this gate is made of FRP kind of material, not even stone. Dil me yeh hi awaz aayi ....Mai royu ya hasu karu mai kya karu


The next eyesore was the cemented stairs. I was told that earlier there was partly destroyed stone stairs which was now rebuilt.Even though these stairs look very out of place but I felt it helps in gaining easy accessibility to the fort. 



With these two eye sores I was worried that I will end up with sore eyes.( I know It was a PJ , Jaane do yaaro. Maff kardo !!) Climbing on the stairs we see a small cave of Laxman swami maharaj on left side.


Next to that there is another small empty cave. Leaving behind both the caves next to that was a small secret passage 



and little further to it is on the left is  a small temple and on the right side is a huge shed. All this time we were moving casually because the climb was very easy and soon we reached the next level.


View from next level


















Little traverse from behind the shed and walking up we reach next level. You can see the entire route in the picture below.




Green coloured shed and the traverse from
behind that takes you one more  level up

Now this was interesting because the view from this point was amazing, on the extreme right the authorities have built small shack or shade where one can sit and view the valley.


Just next to this shade there is a remains of rampant walls , I climbed on that to reach the next level.



From this wall little above me I could see the bhuruj wall. As I walked towards it I realised that there was another Darwaja or Gate.


Walk on the Rampant wall
Walking straight on this wall for come distance is the second Darwaja known as Trimbhak Darwaja. Picture below gives you another view from Trimbhak Darwaja side.



Behind me is the Trimbhak Darwaja

Keeping this gate behind you, one can see temple with a water tank next to it.This water tank is protected with the metal mesh wire. For me till here I never felt like I was  on a fort I was desperately trying to get my connect with the history but this modern structures were disturbing me a lot.


Leaving behind the temple and at the far end I could see a viewing shacks so naturally our next target was to reach there.


On far left mountain top is our
 second viewing shack

we started to trek along the mountain and traverse towards that viewing gallery. 


Traversing toward the other side
This trek was of easy gradient and in 15 -20 mins we were on the opposite side.


View from the opposite side of the Plateau
Once we crossed over to this side of the plateau we slowly moved toward the 2nd second viewing hut which we saw from the Trimbhak darwaja side. 


Our lunch halt site, second viewing Hut

For us yeah hamari film ka interwal point tha.Yes we all rested here for a while to take in the beauty of the mountains lying ahead of us. The view was simply amazing.


Some tranquil moments

 The scenic beauty of the place was breathtaking, the breeze so ever cool that we all decided to have our lunch here only. As we had started the trek late therefore our lunch break was limited to 15 mins only keeping in consideration that there is still lot to be explored on the Top.


Nikhil and myself enjoying our lunch
 On the Rocks !!!

After this lunch break we resumed our trek again and we started moving towards the top most  part of plateau. Patta name is very appropriate for this fort because the top portion indeed looks like a long patta kind of thing.One can really feel the hugeness of the place.


Huge Patta Plateau

Far on the top at the extreme left in the picture above we can see another viewing hut and we prepared ourselves to reach there. It looked to far and high from where we standing, that my friend Nikhil asked me are you sure we have to go till there, I said it is part of this fort so naturally we will have to explore it. 


On the way to reach the Top most point
All of us proceeded to reach there, walking on the edge of the plateau offered us one of the most amazing and beautiful sight of curling mountain, series of windmills dipped in the clouds.


Hey do you see the top behind me !!
The incline was gradual though from far it looked steep, the climate was behaving at its best today, especially no rains only clouds and clouds all around us.As we were climbing to the highest point we noticed series of water tanks which were around 12 in numbers,As it was beginning of monsoon so most if the tanks were empty.


12 empty wall tanks on the left  in the picture
In no time we reached the topmost part of the patta fort.The view was again mesmerizing. On our left we had this series of windmills 


Series of windmills 

Further looking far on the horizon, gleaming among the dark skyline we could see Kadwa Reservoir and just behind it curling like serpentine is Dharma river.


 Kadwa Reservoir and Dharma river

on the right side is Auand patta and again series of windmills.We spent some time here, took some pictures and being a vishramgad , dedicated few peaceful moments for Vishram(rest).




Taking a small rest we all started our descend now, as we were descending the atmosphere was becoming more and more overcast, it was getting so dark that one gets the feeling the time must be like 7.30 pm. Slowly the dark clouds engulfed us and we could feel the chill of the clouds.



Clouds engulfing us
Consequent to this it began to rain, The younger lot of adventurers among us started enjoying in salman style(topless) dancing and enjoying the rains, they plodded me to follow their act but luckily I remembered that I don't carry six packs , mera toh pura ka pura family pack hai bhai.So going topless in rain was out, Running and enjoying in the rains we quickly started coming down and on the way we noticed this structure which looked like a dwelling place of past, which was been renovated. I was told that in olden days it was a palace where Shivaji maharaj rested when he was not well.



Moving toward the renovated Palace

Earlier pictures on google showed that this place was in shambles but the authorities are rebuilding and beautifying this place. I am giving here below few pictures for your reference.


After paying our respect to the statue of Shivaji Maharaj we all started our final descend and in no time reached the base of the fort where our jeeps were awaiting us. 


Descending from the palace

We quickly boarded on them and in very very heavy rains we reached Kasara station. I must thank the gods up there for been so kind to us by providing us with the best climate through out the day and bring on the rains when it was time
Information you can use:


Patta Fort has 3 villages at its base:


1) The village of Pattawadi is situated about 35 km from Akole, 

the main Taluka place on the road going towards Taaked. From 

Pattawadi village, Patta Fort is about a 250 meter climb.


2) The village of Taaked is located in the Igatpuri Taluka Nasik 

District. From Taaked, Patta Fort is about a 600 meter climb.



3) The villages of Ninvi and Girwadi, also near Patta Fort, employ 

a steeper and more difficult route. This route is between the 

neighboring city of Avandh and Patta Fort. Ninvi and Girwadi 

villages are beyond Darna dam and can be approached from 

Deolali and Bhagur villages near Nasik.

मागे टाकून एका छोट्या खिंडीत आलो. वाटेत एका झाडाखाली शेंदूर फासलेला एका अनामिक देव होता आणि थोड्या वेळापूर्वी भेटलेली गावातली मंडळीने अक्खा नारळ आणि पेढे देवाला वाहिले होते. देवालाच वाहिलेले मग काय अमरने तो नारळ फोडून आतलेपाणी घटाघटा प्यायला आणि उरलेले आम्हालाही दिले. आम्ही पेढा वाटून घेतला. चवदार खोबऱ्याचा दुधेरी फेस तोंडात काढीत वाटेला लागलो. माथ्यावर ऊन तळपत असले तरी सोनकीच्या साथीने आणि मोठ्या प्रशस्त वाटेने वेगवान चाल धरली. 
           वाट थेट किल्ल्यावर जाईल हा माझा अंदाज साफ फसला आणि आम्ही ६-७ किमी च्या (अंदाजे) दोन तासांच्या वेगवान तंगडतोडीसह पट्टावाडीत पोहोचलो. सर्वेश आणि क्रांतीवीर आमची वाट न पाहता आधी ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या गुहेजवळ भेटतील ह्या नुसार ते आधीच गडावर पोहोचले होते.
       पाच रुपयांची पावतीचे सोपस्कार पार करून डॉक्टरांच्या बॅगेतील एक सफरचंद संपवून नव्या ऊर्जेने गड चढलो. लक्ष्मणबुवांच्या वास्तव्यामुळे गडावर भाविकांची वर्दळ होती. सोबत एक मेडिकल तपासणी असल्याने वृद्ध हि सेवेचा लाभ घेत होते. गुहेत जाऊन काय आहे ते पाहण्याची इच्छा झाली नाही ( का नाही ते कळले नाही_ बाकीचे ट्रेकर जाऊ शकतात. कदाचित मी थकलो असल्याने आणि शूज काढायचा कंटाळा केल्याने जाण्याचे टाळले) असंख्य वानरांच्या गर्दीत वाट काढीत वरील गडाची अधिष्टाती देवी पट्टाई मातेच्या मंदिराजवळ आलो आणि अमर, डॉक्टर धुमाळ आणि मी एक मस्त पडीक मारली चांगला अर्ध्या तासाच्या वर झोप काढली. बाकीचे सह्यभिडु केव्हाच माथ्यावर पोहचलेले. उत्तराभिमुख त्र्यंबक दरवाजा अजून मजबूत अवस्थेत आहे. 
         माथ्यावर असणाऱ्या अंबारखाण्याजवळ पोहोचलो.  हा अंबारखाना आता चांगलाच राखलाय. आत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबाराचा देखावा उभा केला आहे. सोबत अनेक म्युरल आर्टमध्ये बनवलेले शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांची शिल्पे कोरली आहेत. ती पाहण्यासारखी. 
     बाकीच्या भिडूंना कुठून चेव सुटला काय माहिती पण अख्खा किल्ला पालथा घातला त्या निमित्ताने मी पुन्हा अर्धा तासाची एक झोप काढली. त्यांना माथ्यावर सलग एकमेकाला बिलगून १२ टाकी सापडली. तेथून जो नजरा दिसला तो शब्दात न सांगता येणारा...इति सर्वेश.
          अष्टभुजा पट्टाई देवी (भगवती देवी?) च्या मंदिराच्या बाजूला काही पाण्याच्या टाक्या आहेत. 
ह्या रांगेतील थोडा नशीबवान ठरलेला पट्टा उर्फ विश्रामगड. साक्षात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या वास्तव्याने हि जागा पावन झालेली. 
       संगमनेरजवळ आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी पट्टा किल्ल्यावर आले. जवळपास १७ दिवस त्यांचे या किल्ल्यावर वास्तव्य होते. दक्षिणेच्या मोहिमेच्या दगदगीमुळे राजांची तब्येत खालावली होती. येथील थंडगार, शुद्ध हवा आणि जीवाला जीव देणा-या आदिवासी महादेव कोळ्यांच्या कडेकोट पहा-यात थकलेल्या राजांना विश्रांती मिळाली. पुढे राजे कल्याणमार्गे रायगडावर पोहोचले. गडावरून परतताना दस्तुरखुद्द राजांनीच या किल्ल्याचे नामांतर ‘विश्रामगड’ असे केले. परंतु याला पट्टा (किल्ला) का म्हणतात त्याचा मात्र उलगडा होत नाही. त्याचे तसे उल्लेख कुठे सापडत नाहीत. बाजीराव पेशव्यांचे वास्तव्य काही काळ या गडावर होते. (संदर्भ: प्रहार मध्ये विवेक तवटे ह्यांच्या लेखामधून)
विश्रामगडावरील सविस्तर माहिती इथे मिळेल

           विश्रामगडावर चांगली तासभर विश्रांती घेतली. आणि गड उतरायला सुरुवात केली. फारसे इकडे तिकडे न पाहता गडपायथा गाठला आणि .... कडे जेवणाच्या तटावर बसलो तेव्हा पावणे चार वाजले असतील. ठरल्याप्रमाणे बितनगडला कात्री लागणार हे ठरले आणि प्लान बी बनवला पण जेवता जेवता मी काकांना बितनगड किती लांब आहे हो ? ह्यो जवळच कि 
१५ मिनिट लय झाली... इति काका . 
काहींनी हातातला घास तसाच ठेवला
काहींनी न चघळताच गिळून टाकला 
जे पाणी पित होते त्यांना ठसका गेला. 
        सर्वांनी हा किल्ला करून टाकू असा निर्धार केला. घड्याळाकडे बघता हे अशक्य आहे हे कळले पण निदान गडाच्या पायथ्याला जाऊन गड बघून येऊ असा हट्ट धरला गेला आणि हात धुतल्यावर 
गाडीची चाके अखेर बितनगडाकडे वळली होती. 
     अवघे दोन तास हताशी होते. किल्ल्यासाठी नेमका किती वेळ लागेल ह्याचे ज्याकडे विचारू त्याच्याकडे वेगवेगळे होते. जितका अभ्यास केला होता त्यानुसार वेळेचे गणित मांडले तर आधीचे दोन किल्ल्यांनी प्रचंड थकवल्याने ही आकडेमोड चुकणार ह्यावर ठाम विश्वास. अखेर जवळ जाऊन एखादा अंदाज घेऊन तरी पहावा म्हणनू बितनगडाकडे धूम ठोकली होती. आणि अर्जुन आणि संजय च्या साथीने किल्ला वेलेह्त सुखरूप आणि व्यवस्थित पाहून झाला होता. 
      बितनगडावरून सिन्नर गाठण्याआधी ओंकार दादाने सुचविल्याप्रमाणे  वाटेतील टाकेद गावातील सर्वतीर्थला भेट दिली. बितागा गावापासून टाकेद १५ किमी आहे. इथली कथा थोडी रंजकच आहे. सर्व तीर्थ टाकेद हे ते पवित्र स्थान आहे जेथे रावणाशी युद्ध करून जखमी झालेल्या गरुड राज जटायू साठी प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारून सर्व तीर्थांना बोलाविले..कुंभमेळा साधू या पवित्र ठिकाणी स्नान करतात. येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते .(संदर्भ: विकीमॅपिया) जटायूचा संघर्ष आणि त्याचे प्राणोत्क्रमण जिथे झाले ते जटायू मंदिर मात्र दुर्मीळच म्हणायला हवे त्यामुळे आपण ह्या दुर्ग त्रिकुटाच्या भेटीत न चुकता पाहून घ्यावे. इथं अजून एक वैशिष्ट्य आहे कि एक पिंड आहे तिथं लिंगाच्या जागेवर दोन - अडीच फुटाचा खड्डा आहे त्यात एक गोल गुळगुळीत पाषाण आहे तो त्या खड्ड्यात हात घालून वर उचलायचा आणि आपल्या मनातील इच्छा बोलायच्या अशी एक श्रद्धा भाविकांमध्ये आहे.
पुण्याकडे प्रस्थान ठेवले तेव्हा आठ वाजून गेले असतील. एका सुंदर दर्जेदार भटकंतीसह सीमोल्लंघन पार
पडले होते.
आयुष्याच्या एका सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेण आणि पुन्हा नव्याने जगेन.
_______________________________________________________________________
नोंदी: पुणे मुंबईकरांनी एक दिवस आधी गडपायथा गाठल्यास आणि वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास तीनही किल्ले आणि टाकेद मधील सर्वतीर्थ मंदिर एकाच दिवसात होतात. त्यासाठी प्रचंड शारिरीक क्षमता आणि सहनशक्ती हवी.
ट्रेक दिनांक:  २९-३० सप्टेंबर २०१७
पाण्याची व्यवस्था: औंढा आणि. पट्टा उर्फ विश्रामगड ला  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. बितनगडला नाही. 
जेवणाची व्यवस्था: खालील गावात होवू शकेल. 
कसे जाल: 
औंढा : पुण्यापासून २०४ किमी वर असणारे नाशिक फाटा – सिन्नर मार्गे आवंढ वाडी गाव गाठायचे. तिथे मुक्कामास हनुमान मंदिर प्रशस्त आहे साधार ५० एक जण झोपू शकतील. गावातून औंढ्याचा सुळका दिसतो समोर दिसणाऱ्या खिंडीत चढून (१५ मिनिटे) मग औंढ्यासाठी डावीकडे पठारावरून वळावे पोटसूळका गाठावा(अर्धा तास) सुरक्षिततेसाठी स्टील ची साखळी लावलेली आहे. येथून पुढे एक अवघड पॅच आहे पण थोडी कसरत करून चढता येईल.  तरीही सुरक्षिततेसाठी एखादा ५० फुटांचा रोप सोबत असावा.
पट्टा उर्फ विश्रामगड: औंढावरुन पट्टाकडे जाणारी थेट पायवाट आहे. अंदाजे ५ एक किमी ची असेल. किंवा अवंढ वाडीतून अंदाजे ३९ किमी चा गाडी रस्ता आहे.  पट्टावाडीतून १५ मिनिटात गडाच्या पहिल्या गुहेजवळ जाता येते. किल्ला प्रचंड विस्ताराचा आहे. आपल्याला काय काय पाहायचे आहे ते आधीच ठरवून ठेवणे. 
बितनगड: बितागा हे गडपायथ्याचे गाव. पट्ट्यापासून ११ किमी वर आहे. ह्या गावातून किल्ला पायथ्याशी पोहचण्यास २५ मिनिटे लागतात. प्रत्यक्ष चढाई २० मिनिटांची आहे.
सहभागी भटके: डॉ. सुनील धुमाळ, सर्वेश धुमाळ, विशाल साळुंखे, अमर मिश्रा, कल्पेश, क्रांतीवीर भुईम्बर, आणि  देवा घाणेकर.
खर्च: प्रत्येकी ८०० रु.

वीर येथील दसरा





















 Patta fort Vishramgad

Patta fort Vishramgad

Patta or Vishramgad (1396 meters) from mean sea level

Patta/Vishramgad fort is spread to almost 10 kilometers east to west and almost 7 kilometers north to south
Thus this fort is having a vast expanse hence many base villages

Base villages for Patta fort
1) Pattawadi, Taluka Akole dist Ahmednagar
2) Kokanwadi Taluka Akole dist Ahmednagar
3) Tirdhe, Taluka Sinnar Dist Nasik
4) Taaked ,Taluka Igatpuri dist Nasik
5) Ninvi-Girwadi Near Deolali camp Taluka and District Nasik

Location
Patta /Vishramgad fort  is located in Kalsubai range a mountain range which emerges from Sahyadris at Alang-Kulang and Madangad forts near Igatpuri and run east-west direction till Sinnar in Nasik District 
Kalsubai the highest mountain in Maharashtra(1648 meters) is located in this mountain range hence this range is called as Kalsubai range
Patta fort is 4th mountain east of Kalsubai towards Deolali -Sinnar but geographically this fort is located in Akole Taluka of Ahmednagar

How to reach here
By ST bus,it is very inconvinient
From Akole ST bus stand,there is ony one bus around 4:30 pm to paach-pattewadi.You need to get down at a village nearby and walk around 4 kms to reach Pattawadi till evening,make an overnight stay in that village and climb Patta fort from here next day and come back
From Sinnar in Nasik,there are buses to Konambe village and from there,you need to walk till Tirdhe village and then by Traversing Avandh fort,you need to reach Patta fort in 4 hours through Dilli Darwaza(Shown in one photograph below)
From Bhandardara/Akole,there are few buses and jeeps to Ekdara village and from there you need to walk around 2 hours to reach Pattawadi and climb this fort

Thus if you want to trek this fort,you need to have your own vehicle and drive around 400 kms a day(From Pune/Mumbai).That is the only convinient way



History of Patta fort
Patta fort earlier belonged to Mughals but in year 1671,Moropant Pingle was on a mission of capturing forts in Nasik and Baglan range and thus in year 1672,Moropant Pingle was succesful to capture this fort
Chatrapati Shivaji Maharaj during raid on Jalna in year 1679 rested for some time near Sangamner and unfortunately the Maratha army was siezed from all sides by Mughal army and Shivaji Maharaj was ill during that time. Bahirji Naik succesfully rescued Shivaji Maharaj and took him to Patta fort. Shivaji Maharaj stayed on this fort for around 1.5 months to recover from illness(After Rajgad and Raigad,Patta is the only fort where Shivaji Maharaj stayed for this much long time)

During Peshwa period,this fort was used as a hill station by royal families.Later during British rule,freedom fighters used this fort for their place of hiding hence it was destroyed and dismantled by britishers after year 1820.Now only few remains of palaces are seen


Following are photographs with description

                                  


The huge spread and traverse of Patta fort.From one end to other,it is almost 10 kms long
                                   

On the way to Patta fort,A Plateau on the way.After walking 3 kms,you reach a plateau above Pattawadi village

                                     
Cannons on way to Patta fort
                                     


Reaching halfway fom Pattawadi village

Approaching caves where Samadhi of Laxmangiri Maharaj is located
                           

Samadhi of Laxmangiri Maharaj at a cave on Patta fort
                                     


                                        


                                


Pattai devi temple
                                   




Dilli Darwaza the route from Avandh fort via Tirdhe meets here
                                   


Water tank on Patta fort.This water is supplied to Pattawadi village
                                 



Remains of Palace on top
                               

                             
                                 

                             
Inside Palace
                                  




The point from where cannons were fired from this fort
                         
                              



Nearby Patta fort summit




From Patta fort summit.A very very strong wind was blowing here and it was enough  to blow away anybody



Kokanwadi village seen below from Patta fort Summit





Traverse of Patta fort towards Avandh


                           




Mahakaal mountain(1450 meters) near Ekdara the neighbour of Patta fort and Kalsubai(Not seen due to dense clouds and fog)


Mhaiswalan ghat on road to Igatpuri

                              
Windmills on way to Taaked in Mhais-walan ghat

Scene from Mhaiswalan ghat


                           
Taaked village near Igatpuri
                           


Sarvateerth at Taaked.There is one Jataayu temple and Ram temple in its surroundings.
                            \

                             
                              

http://ontheedgeofsahyadris.blogspot.com/2012/07/patta-fort-vishramgad.html

पट्टगड /विश्रामगड



नाशिक -नगर सिमेलगत नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात उत्तर दक्षिण दक्षिण पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला येतो .संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते .दुसरा ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही जाता येते .याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सानंददरी याच परिसरात येतात .

 खिरवडी मार्गे गेल्यास अगदी पट्टया प्रमाणे पसरलेला हा दुर्ग नजरेस पडतो म्हणून याला पट्टागड असे जुने नाव आहे .गडाच्या अगदी पायथ्यापर्यन्त गाडी जाते व गडावर चढाई करतांना आत्ता कृत्रीम रस्ता तयार केला गेला आहे .त्र्यंबक दरवाज्याच्या बाजूने वनविभागाने एक कमान उभी केली आहे त्या ठिकाणी नाममात्र शुल्क आकारून नाव नोंदणी केली जाते .या ठिकाणी गडावर सापडलेल्या काही प्राचीन वस्तु जतन करून ठेवलेल्या दिसतात (तलवार,नाणी,दागिणे,खडे,आदि ) गडाची चढाई करतांना गडाची नकाशासह माहिती दर्शविणारे फलक लावलेले आहेत .भककम नैर्सगिक तटबंदी सोडता ज्या ठिकाणी गरज आहे अश्या ठिकाणी मजबुत तटबंदीचे अवशेष आढळतात .वाटेत या गडावर असंख्य गुहा कोरलेल्या अाहे,त्यात पाण्याचे टाके सुद्धा आहेत तसा ह्या गडाचे बांधकाम शेकडो वर्षापूर्वीचे {१२व्या -१३ व्या शतकातील}असावे असे दिसते .अलीकडच्या काळात ग्रामस्थानी पट्टादेवीचे मंदिर बाधलेले वाटेत दिसते गडावर पोहचताच अंबरखाना नजरेस पडतो याला राणीमहलही म्हणतात . एवढी एक इमारत गडावर बऱ्यापैकी दिसते यात आता आतमध्ये शिवचरित्रावरील असंख्य प्रसंग शिल्पामध्ये साकारलेले दिसतात .बाहेर शिवरायांचे सुंदर स्मारक आहे .बघताचक्षणी प्रत्येकजन नतमस्तक होतो येतांना वाटेत त्र्यंबक दरवाजाही लागतो .अंबरखान्याच्या मागच्या बाजूस उंचावर बालेकिल्ला असावा असे अवशेष् आहे .या किल्ल्याची उंची १३९२ मीटर आहे .

अंबरखाण्याच्या मागच्या बाजूने चालत गेले की दगडात कोरलेली पाण्याची भव्य टाकी दिसते हे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते









‌समोर पठारावरून सोनटेकडीकडे जातांना पाण्याचे १२ टाके दिसतात शुद्ध पाण्याने भरलेले हे टाके आहेत यापैकी काही टाके लिक  असल्याने त्यात पाणी दिसत नाही .या टाक्यातील निघालेल्या दगडापासून गडाचे बांधकाम होत असे .सोनटेकडी वरुन टेहाळनी करतांना C अाकाराची कातरकडा दिसते . समोरच औंढा किल्ला दिसतो .या टेकडीवर जातांना काळजी घ्यावी लागते प्रचंड वेगाने वारे वाहतात व बाजूला खोल दरी आहे .सुरक्षा म्हणून लोखंडी कटघरे लावली आहे .पण काळजी घेणे महत्वाचे .




                     हा किल्ला बाराव्या शतकात बांधला गेला पण शिवचरीत्रात या किल्ल्याचे वेगळे महत्व आहे , १६७२ मध्ये मोगलाकडून हा किल्ला मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्यात आणला होता .शिवरायांच्या १८३०६ दिवसाच्या आयुष्यात त्यांनी राजगडावरील काही दिवस सोडले तर इतर दिवस त्यांची रयतेच्या सुखासाठी सतत घोडदौड सुरु होती त्यांच्या आयुष्यात  थोडी देखील उसंत त्यांनी घेतलीच नाही .या किल्यावर मात्र शिवरायांनी १६७९ मध्ये १७ दिवस विश्रामासाठी वास्तव्य केले कारणही तसेच होते ,शिवरायांनी जालना शहरावर स्वारी केली व यास्वारीनंतर रायगडाकडे परतत असतांना रनमस्तखान त्यांचा पाठलाग करत आला होता.सोबत बर्हिजी नाईक होते त्यांना या भागाची बरीच माहीती होती.रनमस्तखानाला चुकवत ते महाराजांना सुरक्षीत पट्टगडावर घेऊन आले .महाराजांनी १७ दिवस या किल्ल्यावर आराम केला .जातांनी या किल्ल्याला विश्रामगड असे नाव दिले .शिवरायांच्या वास्तव्याने अन पदस्पर्शने पावन झालेला हा गड भ्रंमंती करत असतांना प्रत्येक शिवप्रेमीना या गडाचा काना अन कोपरा एक प्रेरणा देवून जातो .
     पेशव्यानी सुध्दा या गडाचा उपयोग थंड हवेचे ठिकाण म्हणून केला.अश्या या किल्ल्यास एकदा तरी भेट दयावी .





      संजय खांडवे
      9011971122

https://shivjagars.blogspot.com/2020/06/blog-post_24.html


पट्टागड


प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नगर

उंची : ४३९६ फुट

श्रेणी : सोपी

अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगररांगेच्या पूर्वेला औंढा, पट्टा, आड आणि बितंगगड हे किल्ले वसले आहेत. या सर्व किल्ल्यांत पट्टा इतरांपेक्षा जास्तच भाग्यवान आहे कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींची चरणधूळ या किल्ल्याने आपल्या मस्तकी धारण केलीय. पट्टागड हा किल्ला बितनगड व औंढा यांच्या मधील टप्प्यात आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील हा गड आजही दिमाखात उभा आहे. पट्टागडावर शिवाजी महाराज काही काळ थांबल्याने हा गड विश्रामगड म्हणुन देखील ओळखला जातो. गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. गडाच्या पूर्व दिशेला पायथ्याला लागून असलेल्या पट्टावाडी गावातून जाणारी वाट सगळ्यात सोपी आणि जवळची आहे. कोकणवाडी गावातून गडाच्या दक्षिण दिशेने दुसरी वाट आपल्याला गडावर घेऊन जाते पण तुलनेने ही वाट अवघड आहे तर तिसरी वाट औंढा आणि पट्टा किल्ल्याच्या मधून वर येते. ही वाट सर्वात कठीण आहे. पहिल्या वाटेने गडावर जाण्यासाठी घोटी- भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. टाकेद गावातून म्हैसमाळ घाटमार्गे कोकणवाडी फाटा ९ कि.मी. अंतरावर तर कोकणवाडी फाट्यापासून पट्टागडाच्या पायथ्याची पट्टावाडी ८ किमीवर आहे. पट्टावाडी हे गाव डोंगराच्या पठारावर वसलेले असुन गडाची समुद्रसपाटीपासून उंची ४५६६ फूट तर पायथ्यापासुन उंची ९०० फुट आहे. पट्टावाडीकडे जाताना वाटेवरूनच पट्टागडाच्या पुढे आलेल्या दोन डोंगरसोंडेवरील बुरुज व तटबंदी आपले लक्ष वेधून घेतात. पट्टावाडीतून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे. हा रस्ता संपताना डाव्या बाजुला एक पडीक वास्तू दिसुन येते. या वास्तुशेजारी एका झाडाखाली काही कोरीव मुर्त्या ठेवलेल्या दिसुन येतात. या रस्त्याच्या शेवटी वनखात्याची चौकी असुन येथे ५/- रुपये प्रवेश शुल्क भरुन व नावपत्ता नोंदवुन गडावर जाता येते. गड चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला एका चौथऱ्यावर एका हत्तीणीचे शिल्प व शेजारील खडकावर चाकावर ठेवलेली तोफ दिसुन येते. थोडा चढ चढुन गेल्यावर वनखात्याने पायऱ्यावर अलीकडेच बांधलेली फायबरमधील दरवाजाची प्रतिकृती दिसते. पायऱ्याच्या वाटेने वर चढतांना डाव्या बाजुस तासलेला कातळ व काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. पायऱ्याच्या वाटेने वर आल्यावर लहान तोंड असणारी गुहा दिसते. रांगत जाता येईल एवढीच या गुहेची उंची असुन पाणी भरलेले असल्याने या गुहेत जाता येत नाही. या गुहेत पाण्याचे टाक असावे. या गुहेपासून वर गेल्यावर डावीकडे दोन गुहा लागतात. यातील एका गुहेमध्ये लक्ष्मण महाराज या साधूचे वास्तव्य होते. हि जैन गुहा असुन गुहेच्या भिंतीवर एका बाजुला नेमीनाथ यांची प्रतिमा तर दुसऱ्या बाजुला यक्ष प्रतिमा कोरलेली दिसते. या गुहेचे ओसरी व दालन असे दोन भाग असुन आतील दालनात प्रवेश करण्यास मनाई आहे. गुहेबाहेरील ओवरीत दोन जैन देवता मुर्ती दिसुन येतात. बाजूची दुसरी गुहा साधारण आहे. येथुन पुढे उजव्या बाजुलाही दोन गुहा आहेत. यातील मोठया गुहेत लक्ष्मण महाराजांची समाधी आहे तर दुसऱ्या गुहेत चतुश्रुंगी देवीची मुर्ती आहे. गुहेच्या बाहेर पाण्याचा नळ असून गडाच्या वरच्या टाक्यातील पाणी नळाने इथे आणले आहे. या दोन्ही गुहेत व गुहेच्या समोर असलेल्या प्रशस्त प्रांगणावर पत्र्याचे झाकण आहे त्यात रहाण्याची सोय होते. गुहेच्या समोरच गडाचा वनखात्याने निवारा छत्री बांधलेला एक बुरूज असुन या भागात गडाची तटबंदी व तटावर जाणाऱ्या पायऱ्या आहे. गुहेजवळून जाणाऱ्या पायऱ्या चढून वर गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि किल्ल्याच्या अवशेषांना सुरुवात होते. समोरच गडाचा उत्तराभिमुख त्रिंबक दरवाजा आजही उत्तम स्थितीत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला व वरील बाजुस बुरूज आहेत. येथून खाली उतरणारी वाट पट्टावाडीत जाते. त्रिंबक दरवाजा पाहून वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. येथे सातवाहन कालीन पिण्यायोग्य पाण्याची खोदीव टाकी आहेत. यातीलच पाणी पाईपने खालील मोठ्या गुहेपर्यंत पोचवले गेले आहे. या टाक्याशेजारी जिच्यामुळे या किल्ल्याला "पट्टा" नाव पडलं त्या पट्टाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा अलीकडेच जीर्णोध्दार केलेला आहे. मंदिराच्या मागील बाजुस असणाऱ्या उंचवट्यावर गडाचा बुरुज असुन वनखात्याने त्यावर निवारा छत्री बांधली आहे. मंदिरा समोरून पुढे जाउन पायवाटेने वर चढत जाताना जोत्यांचे अवशेष दिसतात व अखेरीस आपण एका प्रशस्त दगडी इमारतीपाशी येतो. या इमारतीला अंबरखाना म्हणतात. अंबरखान्याची वनखात्याने डागडुजी केलेली असून बाहेरील बाजुस मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. अंबरखान्याला दोन छोटे दरवाजे असून बाहेर झेंडावंदनाचा एक खांब रोवला आहे. या इमारतीचे छ्त घुमटाकार असुन आत प्रशस्त दालने आहेत. या दालनात शिवचरित्रातील फायबरमध्ये बनविलेले अनेक प्रसंग लावण्यात आलेले असुन आतील मंचावर शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला फायबर पुतळा ठेवलेला आहे. अंबरखान्याभोवती बाग फ़ुलवलेली आहे. अंबरखान्याच्या आवारात पाच-सहा वास्तूंचे चौथरे दिसतात. अंबरखाना पाहुन झाल्यावर किल्ल्यावरील अवशेष पाहाण्यासाठी अंबरखान्याच्या मागुन वरच्या दिशेने चढत जावे. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावरून उजव्या बाजुला औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो. या पठारावर उजव्या बाजूला औंढा किल्ल्याच्या दिशेने जाताना सर्वप्रथम पाण्याचे एक मोठे टाके लागते यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे गेल्यावर परत पाण्याची दोन मोठी टाकी व त्याच्या पुढे सुकलेल एक टाक आहे. या टाक्यांपुढे खडकातून चिरे काढताना अर्धवट राहिलेले चिरे दिसतात. दगडाच्या या खाणीपासून दोन वाटा निघतात. एक डावीकडे गडाच्या उंच भागात जाते पण या भागात काहीही अवशेष नाहीत तर दुसरी उजवीकडे औंढा किल्ल्याच्या दिशेला जाते. या वाटेने पुढे गेल्यावर एक गुहा लागते. गुहेचे ओसरी आणि दालन असे दोन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली असुन दालन चार खांबांवर तोललेल आहे. या गुहेच्या पुढे जाताना खालील बाजुस उतारावर ओळीत खोदलेली पाण्याची ७ टाकी दिसतात. पुढे सरळ चालत राहिल्यास अजुन एक गुहा पाहायला मिळते. या गुहेच्या बाहेरच्या बाजुला जमिनीवर कातळात खोदलेले धान्य कोठार आहे. या धान्य कोठाराची जमिनीवर खडकात बांधलेली तीन तोंडे व त्यावरील दगडी झाकणे पाहायला मिळतात. या दोनही गुहेशेजारी पाणी असल्याने येथे रहाण्याची उत्तम सोय होऊ शकते. गुहेच्या पुढे चालत गेल्यावर एकामागोमाग एक अशी पाण्याची १२ टाकी लागतात या टाक्यांना बारा टाकी म्हणून ओळखले जाते. यातील शेवटच्या टाक्याच्या मागे कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेत आत पाणी घेण्यासाठी दगडी भिंतीत पन्हाळी कोरली आहेत. बारा टाक्याच्या खालील बाजुस पठारावर अजुन एक पाण्याचे मोठे टाके दिसते. गडावर पाण्याची ३० पेक्षा जास्त टाकी आहेत. या पायवाटेने औंढा किल्ल्याच्या दिशेने सरळ गेल्यावर १५ मिनिटात आपण पट्ट्याच्या उत्तराभिमुख दिल्ली दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाची कमान उध्वस्त झालेली असुन दरवाजाच्या बाजुचे बुरुज शिल्लक आहेत. दरवाजापासून किल्ल्याच्या खालच्या बाजुला गेलेली तटबंदी ढासळलेली आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजुला पाण्याच एक मोठे खोदीव टाक आहे. येथुन पुढे जाणाऱ्या पायवाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते. दरवाजा पाहुन आल्यावाटेने मागे फ़िरुन अंबरखान्याच्या वरील बाजुने डावीकडे गेल्यावर काही वास्तूंचे अवशेष दिसतात. पुढे शिवकालिन बंधारा व पुढे अजुन एक तलाव पाहायला मिळतो. गडाच्या डाव्या टोकावर दोन भव्य बुरुज आहेत. हे बुरुज आपल्याला पट्टावाडीत येताना रस्त्यावरून दिसलेले असतात. हे बुरूज पाहून खाली उतरणाऱ्या वाटेने आपण पट्टादेवी मंदिराकडे येतो.येताना वाटेत वनखात्याने निवाराछत्री बांधलेला अजुन एक बुरुज दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास ४ तास लागतात. पट्टागडाच्या सर्वोच्च भागात उभे राहिल्यावर चारही दिशांचा लांबवरचा मुलुख नजरेस पडतो. पश्चिमेस कळसूबाई, त्रिंबकगड ,अलंग, मदन आणि कुलंग हे दुर्ग दिसतात तर दक्षिणेला बितनगड, महांकाळ डोंगर आणि उत्तरेला औंढा,आड हे किल्ले दिसतात. पट्ट्यापासून औंढयापर्यंत गेलेल्या कोकणकड्याच्या आकाराची डोंगरकडा फारच सुंदर दिसते. गडाच्या पूर्व उतारावर म्हाळुंगी आणि आढळा या नद्या उगम पावतात. या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे. गडाच्या इतिहासात डोकावले असता गडाला फार मोठा इतिहास असल्याचे कुठेही सापडत नाही. पण गडावरील पाण्याची सोय व अवशेषांची उपलब्धता पहाता गड नांदता असताना गडावर खूप मोठया प्रमाणावर वस्ती असावी. संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातील अरण्यकांडात औंढा व पट्टा किल्ल्य़ांचा उल्लेख आढळतो तो असा रावणाचा छेदिला आंगोठा तेथे झाला औंढापट्टा / त्रिंबकीच्या बिकटघाटा अवंढा-पट्टा प्रसिध्द. यावरून यादव काळात हा गड अस्तित्वात होता. या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात (इ.स.१३४७ ते इ.स.१४९०) झाले असावे. चौदाव्या शतकात पट्टा किल्ला बहामनी साम्राज्यात असल्याचे उल्लेख आढळतात. त्यानंतर याचा ताबा येथील स्थानिक महादेव कोळी जमातीकडे गेला. इ.स. १४९० मध्ये बहामनी साम्राज्याची शकले झाल्यावर हा किल्ला निजामशाहीत गेला. इ.स. १६२७ मधे मुगलांनी हा किल्ला जिंकला. इ.स.१६७१ मध्ये मोरोपंतानी हा किल्ला जिकूंन स्वराज्यात दाखल केला पण १६७२ मधे मोगलांनी हा किल्ला परत घेतला. इ.स.१६७५ मध्ये मोरोपंत पिंगळ्यांनी पट्टागड दुसऱ्यांदा स्वराज्यात आणला. सन १६७९ मध्ये दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची लूट केली. इतिहासातील नोंदीप्रमाणे १५ नोव्हेंबर १६७९ रोजी महाराजांनी ही लूट केली. महाराज हि लुट घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मोगल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळील रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. तीन बाजूंनी शत्रू सैन्याने महाराजांना घेरले. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात लढाई झाली. महाराजांबरोबर असलेल्या आठ हजार पैकी चार हजार सैन्य कामी आले. महाराजांच्या कारकिर्दीतली हि शेवटची लढाई. त्यात खानाच्या मदतीला औरंगाबादेहून मोठी फौज रवाना झाल्याची खबर आली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची अशी रणनिती ठरवुन बहिर्जी नाईकांनी निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराजांना आणि मिळालेल्या लुटीला पट्टा किल्ल्यावर पोहोचवले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी पट्टा किल्ल्यावर आले. दक्षिणेच्या मोहिमेच्या दगदगीमुळे राजांची तब्येत खालावली होती त्यामुळे १७ दिवस त्यांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. गडावरून परतताना राजांनी या किल्ल्याचे नामांतर विश्रामगड असे केले. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. महाराजांच्या मृत्युनंतर इ.स.१६८२ साली औरंगजेब महाराष्ट्रात आला व त्याने मराठयांचा प्रदेश जिंकण्यास सुरवात केली. १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेतले. मोगलांनी १६८८ ते ८९ या काळात मराठ्यांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड हे किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांना जिंकून घ्यावा लागला. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबला लिहितो की सेवकाने १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यातील पट्टा व इतर किल्ल्याखालील जमीनदारांना रकमा देण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. इ.स १६७१ मधे माधवरावांनी पट्टागड मुगलांकडुन जिंकला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांनी हा किल्ला मराठयाकडून जिंकुन घेतला.
© Suresh Nimbalkar


पाच एक मिनिटांत विश्रामगडाच्या सुप्रसिद्ध बाबाच्या गुहे समोर पोहचलो. तिथे माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. त्यांना दुरुनच रामराम करुन आम्ही पुढे निघालो.

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

पुर्वीच्या काळी वापरात असलेला दरवाजा.

प्रचि २७

प्रचि २८

दरवाजा शेजारील बुरुजावरुन पट्टावाडीचा सुंदर नजारा दिसतो. अश्या सुंदर ठिकाणी योरॉक्सला उड्या मारण्याच स्फुरण न मिळाले तरच नवल!

प्रचि २९

दरवाज्या डावीकडून पुढे निघाल्यावर वाटेत सिमेंटचे होऊ घातलेले नविन मंदिर दिसते. त्या मंदिरा मागुन वर गेल्यावर अंबरखाना दिसतो.

प्रचि ३०

अंबरखान्या समोर महाराजांचा अर्धपुतळा उभारण्यात आलेला आहे.

प्रचि ३१

अचानक आभाळात ढगांनी गर्दी केली. पुढं जावे की मागे परताव या विंचनेत असताना डोक्यावरुन ते सरसर निघुनही गेले.

प्रचि ३२

अंबरखान्याच्या मागील बाजुने वर चढत गेल्यावर गडाच्या पश्चिमेला असलेल्या कड्याचे विलोभनीय दृष्य दिसते.

प्रचि ३३

पश्चिम क्षितीजाचा आसमंत पावसाळी ढगांनी अगदी व्यापुन टाकला होता. आणि त्यामुळेच आम्हाला निसर्गाचा अद्भुत अविष्कार पाहण्याच भाग्य लाभलं . पट्ट्याच्या डाविकडे कळसुबाई आणि AMK वर ढगांतून पडलेल्या प्रकाशझोताचे चित्ताकर्षक पोट्रेट पाहताना भान हरपले होते.

प्रचि ३४ याची साठी केला होता अट्टाहास...

प्रचि ३५

प्रचि ३६

किती तरी वेळ तो सुंदर नजारा बघत होतो तरी मन तृप्त होत नव्हते. अंधार पडायच्या आधी गडफेरी पुर्ण करायची होती, म्हणुन मग गडाच्या उत्तरेला औढाच्या दिशेने निघालो. आमच्या प्लॅन मधे नं.२ वर असलेला किल्ला औंढ कातळ प्रस्तारोहण असल्या कारणाने करता येणार नव्हता. त्यासाठीचा लागणारा रोप सुन्या घेऊन येणार होता, पण ऐनवेळी तो टांगारु झाल्यामुळे मिळू शकला नाही. पट्ट्याच्या पठारावर जागोजागी पाण्याची टाकं आहेत. त्यातील काही गळकी असल्याने कोरडी झाली होती.

प्रचि ३७ औंढा

पा











































No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...