Wednesday, July 12, 2023

बितनगड

अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगर रांगेच्या पूर्वेला औंढा, पट्टा, आड आणि बितंगगड हे किल्ले वसले आहेत. बितनगड हा किल्ला कळसूबाई व पट्टागड यांच्या मधील पट्टयात आहे. बितनगडाचा परिसर शिवस्पर्शाने पावन झालेला आहे; पट्टा किल्ल्याच्या रांगेतील हा गड गनिमी हल्ल्यासाठी कायम तयार असल्यासारखा भासतो. औंढा – पट्टा या किल्ल्यापासून सुरु झालेली डोंगर रांग पुढे थेट अलंग, मदन, कुलंग या दुर्ग त्रिकुटापर्यंत येऊन थांबलीय, पण यात बित्तनगड मात्र दिसतच नाही; तो एखाद्या पाठीराख्यासारखा भासतो. इतिहासातही बित्तनगडाचा उल्लेख क्वचितच आढळतो, त्यामुळेच की काय ट्रेकर्स मंडळी औंढा – पट्टा पर्यंत येतात पण बाजूच्याच बित्तनगडाकडे सहसा कोणी फिरकत देखील नाही. 


 
मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून म्हैसवळण घाट चधून कोकणवाडी , एकदरा या गावांना जाणारा रस्ता आहे. एकदरा गावातून एक रस्ता बितनगडच्या पायथ्याच्या बितका गावात जातो. दुसरा रस्ता पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पट्टावाडीत जातो. तर सरळ जाणारा रस्ता खिरवीरे गावात जातो. एकदरा ते बितका या बितनगडा जवळील गावाचे अंतर ५ किलोमीटर आहे. या भागात एसटी बसेसचे प्रमाण आहे. सिन्नर बितका दिवसातून ३ बस आहेत. अन्यथा टाकेद खिरवीरे चालणार्‍या जीप्सनी एकदर्‍याला उतरुन चालत बितनगडाचा पायथा गाठण्यास एक ते दीड तास लागतो.
टाकेद गावातून म्हैसवळण घाटमार्गे एकदरा फाटा ९ किमी अंतरावर तर एकदरा फाट्यापासून बितंगगडाच्या पायथ्याचे बितंगवाडी गाव ५ किमीवर आहे. 

बितनवाडीहून टाकेदकडे जाताना रस्त्यात लागलेले व्याघ्रशिल्प

म्हैसवळण घाट मार्गाने जर निघालो तर घाट संपताच उजवा रस्ता बित्तनगडाकडे तर डावा रस्ता पट्टागडाकडे जातो, आपण उजवा रस्ता धरायचा. गर्द झाडीतील वळणावळणाची वाट आहे. बितका गावात जात असताना आपल्या डाव्या हाताला असणारा उंच व लांबचलांब डोंगर आपली सोबत करतो. या डोंगराला महांकाळ संबोधतात. वाटेत एक दोन ठिकाणी आदिवासी लोकांनी वाघोबाची शिल्प मांडून ठेवली आहेत. खरतर बिताका गावाचे नाव पुर्वी बितींगा होते, ते बदलून बिताका असे अपभ्रंश झाले.

       याशिवाय पट्टागडाच्या पश्चिम पायथ्याला असलेल्या कोकणवाडीमार्गे बितनवाडी हे अंतर केवळ १२ कि.मी. भरते. 
वनखात्याने गावात लावलेले पोस्टर

बित्तनवाडीही (बिताकावाडी) अगदीच टुमदार. फार – फार तर ४५-५० घरांची वाडी. बितनवाडी म्हणजे शेळ्यामेंढया नि गुरांना घेउन वसलेली छोटीशी वस्ती. इथे मुक्काम करण्यासाठी शाळा तर आहेच पण एक हनुमानाचे मंदीरदेखील उत्तम आहे. बितंगवाडी या गावाजवळ असणारा हा किल्ला तसा स्थानिकांच्या दृष्टीने वंचित आहे. आपण जरी या गडाचा उल्लेख बितनगड असा करीत असलो तरी इथल्या लोकांसाठी ‘बितंगा’ म्हणूनच ओळख.. बितनवाडी मुळातच बितंगाच्या खांद्यावर वसलेली.. त्यामुळे बितंगाची चढाई फारशी उंचीची वाटत नाही.गावात या किल्ल्याविषयी कुणाला फारशी माहित नाही पण गड दाखविण्यासाठी वाटाडे मात्र मिळतात. इथपर्यंत येऊन देखील बित्तनगडाचे दर्शन होतच नाही. मग वाडीतच गाड्या पार्क करायच्या, वाटाड्या सोबत घ्यायचा आणि निघायचे बित्तनगडाच्या भेटीला…

वाटेत लागणारी दोन कडयांमधली ही अवाढव्य घळ

गावातून किल्ल्याकडे जाणारी प्रशस्त वाट आहे पण वाटेच्या अखेरच्या टप्प्यात शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो.गडाकडे जाणार्या वाटेवर टोकेरी काळ्या दगड रस्त्यात टाकल्याने कार किंवा मोठी गाडी आणणे गैरसोयीचे. गावातून किल्ला दिसत नाही हे एक वैशिष्ट्य. वाडीतून बाहेर पडलो की छोटा जंगलपट्टा लागतो आणि साधारण वीस मिनिटे चालल्यानंतर बित्तनगडाचे पहिले दर्शन होते, मग गडाला डाव्या हाताला ठेवत चालत रहायचे. अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी येतो. किल्ल्या खालच्या जंगलात शेंदुर लावलेले काही दगड आहेत. यांना स्थानिक लोक माऊली या नावाने ओळखतात.
मेका 

या गडाची चढाई करत असताना वाटेत वेलीवर उगवलेली मेका नावाची काकडी सारखी चवीला असलेली फळे खायला मिळतात. बरोबर स्थानिक गाईड असेल तर हा रानमेवा नक्कीच चाखता येतो. पायथ्याच्या जंगलात हिरडा,आंबा, चिंच हि झाडे तसेच करवंदाच्या जाळ्या आहेत. 
गडाची उंची समुद्रसपाटीपासून ४००० फुट तर पायथ्यापासुन साधारण १२०० फुट आहे. गडाचा आकार त्रिकोणी असुन गडाचे एकुण क्षेत्रफळ ३ एकरपेक्षा कमी आहे. पुढे पायवाट खडी चढण चढत कातळ टप्प्यापाशी पोहोचते. कातळ टप्प्याच्या खाली पायवाटेच्या बाजूला उजवीकडे पाण्याचे चौकोनी भुयारी टाके लागते.
पहिली गुहा 

.साधारण शरिरयष्टीचा माणूस त्या चौकटीतून सरपटत आज जाऊ शकेल इतक ते अरुंद आहे. या भुयारात रांगत जावे लागते. आत जाताना सोबत विजेरी असणे आवश्यक आहे. अर्धवट खोदलेल्या या भुयाराच्या शेवटी पाण्याचे टाके आहे. असेच एक भुयार किल्ल्याच्या विरुद्ध टोकाला किल्ल्याबाहेर आहे. या भुयाराचे तोंड मोठे असुन आतील भागात मात्र रांगत जावे लागते. या भुयाराच्या आत टोकाशी जमिनीलगत खोदलेली २०x२०x १५ आकाराची खोली आहे. या खोलीच्या तळातील भागात अजुन एका भुयाराचे तोंड दिसते. किल्ल्यावर दोन भुयाराशिवाय सातवाहनकालीन दोन खांबी मोठी गुहा आणि सहा पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत पण एकाही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. यातील दोन टाक्याकडे जाता येत नाही त्या केवळ माथ्यावरून पहाता येतात. या टाक्याकडे जाणारी वाट सुरुंग लावून उध्वस्त केली आहे. गावकऱ्यांनी एका कपारीत झऱ्याचे पाणी अडवुन पाण्याची तात्पुरती सोय केली आहे पण पण ती फक्त जानेवारीपर्यंत.
Rock cut steps , Bitangad

गड माथ्यावर जाण्यासाठी १००  पेक्षा जास्त कातळात कोरलेल्या पाय-या चढाव्या लागतात. गोल फिरणाऱ्या देखण्या कमी उंचीच्या खोबण्या असलेल्या पायर्यांनी चढताना सोयीचे पडते.  कातळात कोरलेल्या पायर्‍या अरुंद आहेत. पायर्‍या चढण्या उतरण्यासाठी कातळात जागोजागी खोबण्या केलेल्या आहेत. त्याच्या आधार घेऊन पायर्‍या चढता येतात. पण दरीची बाजू संपूर्ण उघडी (Expose) असल्याने काळजीपूर्वक पायर्‍या चढाव्या - उतरव्या लागतात. इथे कोरलेल्या पायर्‍या या गडाचे वैशिष्टय ! पकडीसाठी खोबणीची सोय असली तर पावसात येथील चढाई नक्कीच थरारक होउ शकते.. या पायर्‍या दोन-तीन टप्प्यात आहेत. अर्थात आता वनखात्याने इथे रेलिंग बसवून चांगली सोय केली आहे. 







 

पायर्‍या संपल्यावर काही अंतर चढून गेल्यावर एक दोन खांबांवर तोललेली प्रशस्त गुहा आहे. पाच-सहाजण सहज राहू शकतील इतकी मोठी..गुहेच्या डावीकडची वाट टाक्यांपाशी जाते. ही वाट फारच निसरडी असल्याने तिकडून न जाणेच उत्तम. दुसरी वाट गुहेच्या डोक्यावरून थेट गडाच्या माथ्याकडे जाते. ही वाट धरायची. थोडे अंतर चढल्यानंतर फुटके टाके लागते, ते बरेच जमिनीत बुजलेले आहे.  पायर्‍यांनी अजुन वरती गेले की पाण्याच्या काही टाक्या आढळतात.. पुढे पायर्‍या संपल्या की सरळ मातीच्या घसरणीचे चढण लागते.. हे पार केले की थेट माथ्यावर ! माथा अगदीच अरुंद.. किल्ल्याचे अवशेष वगैरे काही नाही पण सभोवतालच्या भव्यदिव्य ङोंगररांगा मनाला सहज भुरळ पाडतात..
गुहा पाहून पुढे गेल्यावर एक पाण्याचे फ़ुटलेले टाके आहे. टाक्यापुढे कारवीची दाट झाडी आहे. कारवी साधारणपणे ८ वर्षांनी एकदाच फ़ुलते , तिच्या बीया जमिनीवर पडतात आणि मग मरण पावते. पुढच्या पावसाळ्यात जमिनीवर पडलेल्या बियांपासून नवीन कारवी तयार होते. सुकलेल्या कारव्यांचे दांडे घराच्या भिंती बांधण्यासाठी, छत शाकारण्यासाठी वापरले जातात.कारवीच्या रानामधून पायवाटेने चढत आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. किल्ल्याचा माथा लहान आहे. किल्ल्यावरुन भरपूर मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन आपण चढलो त्याच्या विरुध्द दिशेला खाली उतरुन गेल्यावर पाण्याचे कोरडे टाक आहे. 
    छोट्या चढावानंतर एक उत्तराभिमुख गुंफा दिसते. हि गुहा मुक्कामासाठी योग्य आहे.या गुंफेत अदमासे दहा माणसे राहु शकतात. गडावरची दोन टाकी साफ करत असताना एक छोटेखानी तोफ सापडली. हि तोफ घोडे किंवा उंट यांच्यावरुन वाहुन नेली जात असे.तीला 'सुतरनाल' असे म्हणतात. तसेच शेजारच्या टाक्त्यात पुरातन पाटा, पणत्या सापडलया. वनखात्याने या टाक्यांची दुरुस्ती केली आहे.मात्र त्यासाठी त्यांनी सिमेंटचा वापर करुन टाक्यांचे मुळ रुप घालवून टाकले आहे. 


डावीकडे डोके दिसतेय तो औंढ तर उजवीकडे अगदी धुसर दिसणारा डोंगर म्हणज आडकिल्ला तर मध्ये पसरलेला पटटागड.. अलिकडे बितनवाडीतून इथपर्यंत येणारी वाटही दिसते)
बितनगडाच्या मागच्या बाजूची दरी..
शेणत डोंगराचे कडे नि पवनचक्क्यांचा तुरा

इथून दिसणारी खोल दरी थेट काळजात घुसते.. शेणत डोंगराची उंची वेडावून सोडते.. त्याच्या माथ्यावरील पवनचक्क्यांचा तुरा अगदी डौलाने डुलताना दिसतो.. 

किल्ल्यावर दोन भुयाराशिवाय सातवाहनकालीन दोन खांबी मोठी गुहा आणि सहा पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत पण एकाही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. यातील दोन टाक्याकडे जाता येत नाही त्या केवळ माथ्यावरून पहाता येतात. या टाक्याकडे जाणारी वाट सुरुंग लावून उध्वस्त केली आहे. गावकऱ्यांनी एका कपारीत झऱ्याचे पाणी अडवुन पाण्याची तात्पुरती सोय केली आहे पण पण ती फक्त जानेवारीपर्यंत. 



टाके. 

 गडावरील दोन खांबी गुहेत ८-१० माणसे सहज राहु शकतात पण हि गुहा वापरात नाही शिवाय जानेवारी नंतर गडावर पाण्याची सोय नाही. गडाच्या माथ्यावर जाताना काही उद्‌ध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसुन येतात. गडाची बरीच पडझड झाली असुन एका ठिकाणी तुरळक तटबंदी दिसते. किल्ल्याचा माथा तसा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा. बितंगवाडीतून गडाच्या माथ्यावर येण्यास दीड तास लागतो. किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग, औंढा, पट्टा, आड, म्हसोबाचा डोंगर आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो. हवा स्वच्छ असेल तर त्रिंबकगड आणि हरिहर देखील दिसतात.इथून नक्कीच कळसुबाईच्या डोंगरावर जाणारी थेट वाट आहे.अर्थात स्थानिक व्यक्ती सोबत असेल तरच या वाटेने जाणे शक्य आहे.
    गड उतरताना सरळ खाली न जाता गडाच्या टोकावरील खिंडीच्या दिशेला जाऊन तेथे असलेले भुयार तसेच खिंडीतील लाकडावरील व्याघ्रशिल्प पहाता येते. गड उतरुन आल्यावर झाडीतून मार्ग काढत दक्षीण दिशेला थोड्याशा चढाई नंतर पुर्वेकडे तोंड करुन ५ ५ फुट आकाराची गुहा आहे. हि गुहा आतमध्ये निमुळती होत गेलेली आहे. एकावेळी एकच व्यक्ती आतमध्ये जाउ शकते. आदमासे २० फुट आत गेल्यावर सरळसोट दहा फुटाचा ताशीव खड्डा आहे. या खड्ड्याच्या तळाशी उतरता येते. खड्ड्याच्या तळाशी आतमध्ये जाण्यासाठी पुन्हा रस्ता आहे. मात्र पुढे हा रस्ता बुजलेला आहे. अह्सीच एक गुहा दक्षिण दिशेला अहे. बितनगडाला प्रदक्षिणा घालताना अशा गुहा ठिकठिकाणी दिसतात.    
      किल्ला चढायला कठीण नाही पण खडकात खोदलेल्या पायऱ्या पावसाळ्यात शेवाळामुळे निसरड्या होत असल्याने व गडावर मोठया प्रमाणात गवत वाढत असल्याने पावसाळ्यात गडावर जाणे टाळावे. बितंगवाडीतील हनुमानाच्या देवळात ३० जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गावात विनंती केल्यास घरगुती जेवणाची सोय होते. इतिहासाचा मागोवा घेतला असता या गडाबाबत फारशा नोंदी आढळत नाहीत पण डिसेंबर १६८२च्या एका पत्रात याची नोंद आढळते. रहुल्लाखानाने औरंगझेबला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो शत्रूच्या प्रदेशात बितंगगडाच्या वाडीस आग लाऊन ती जाळली यावरून १६८२ च्या सुमारास हा किल्ला मराठयांच्या ताब्यात असावा.
 उत्तुंग डोंगररांगेत छोटा वाटणारा हा बितंगा त्याच्या उत्तम स्थानामुळे प्रिय वाटतोच.. 

 निसर्गाचा अविष्कार चेमेदेव डोंगर आणि बितनगड Offbeat trek to Chemdev & Bitangad

चेमेदेव 

Chemdev


महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांवर ऊन, वारा, पाऊस आणि वाहाते पाणी यांच्या वर्षानूवर्ष होणार्‍या मार्‍यामुळे त्यांची झीज होऊन अनेक भौमित्तीक आकार आणि रचना तयार झालेल्या आहेत. नेढ ही रचना त्यापैकीच एक आहे. नेढ या शब्दाचा अर्थ सुईच्या टोकाला दोरा ओवण्यासाठी असलेले भोक. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यांना नैसर्गिकरित्या पडलेल्या अशा आरपार भोकांना नेढ म्हणतात. सह्याद्रीत अशी अनेक नेढी आहेत . महाबळेश्वरच्या एलिफंट पॉईंटवरुन दिसणारे नेढे . सप्तश्रुंगी गडावरून दिसणारे नेढे ही सर्वसामान्यांना माहिती असणारी सह्याद्रीतील नेढी आहेत.  सप्तशृंगी गडावरच्या नेढ्या बाबत आणि साल्हेर वरुन दिसणार्‍या नेढ्याबाबत दंतकथाही प्रचलित आहेत. सप्तशृंगी देवी आणि महिषासूर यांच्या लढाईत देवीने केलेल्या प्रहारामुळे महिषासूर डोंगरातून आरपार फ़ेकला गेला आणि नेढ तयार झाले. दुसर्‍या कथेत देवीचा अंगठ्याच्या प्रहारामुळे नेढे तयार झाले. सप्तशृंगी गडावरुन दिसणारे नेढे मोहनदर (शिडका किल्ला) किल्ल्याच्या डोंगरात आहे. साल्हेर किल्ल्यावर परशुरमांचे वास्तव्य होते. किल्ल्यावर त्यांच्या पादुकाही आहेत. परशुरामाने कोकणाची निर्मिती करण्यासाठी मारलेल्या बाणामुळे साल्हेर समोरच्या डोंगराला आरपार भोक पडून नेढ निर्माण झाले अशी दंतकथा आहे.    

सप्तश्रृंगी देवीच्या कथेतील नेढे, मोहनदर किल्ला

पिंपळा (कंडाणा) सर्वात मोठे नेढे 

याशिवाय सह्याद्रीत भटकणाऱ्यांना राजगड, मदनगड,  मोहनदर (शिडका किल्ला) , पिंपळा (कंडाणा) सोनगड,   इत्यादी  गडावरील नेढीही माहीती असतात . त्यात ते उतरलेले असतात किंवा पार करुनही गेलेले असतात . पिंपळा (कंडाणा) गडावर दोन नेढी आहेत. त्यापैकी एक नेढ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेढे आहे.
    करोडो वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे.  त्याकाळी जमिनीतून लाव्हारस बाहेर येऊन जमिनीवर पसरत असे. काही काळाने  हा थर थंड होऊन पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होई . अशाप्रकारे लाव्हारसाचे थर एकावर एक  बसून सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे . यातील काही भाग / थर ठिसूळ  असल्याने ऊन , वारा, पाऊस यांच्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर झीज होत असते. वेगाने वाहाणारा वारा ठिसूळ थरातील माती वाहून नेतो. पावसाचे पाणी या भागात शिरून आपल्याबरोबर माती वाहून नेते . फटीमध्ये साचून राहीलेल्या पाण्याची उष्णतेने वाफ होते . वाफ़ेच्या दाबाने दगडांना भेगा पडतात.  उन्हाळ्यात तापलेल्या दगडावर पाणी पडून भेगा पडतात . अशा प्रकारे  सतत बदलणाऱ्या वातावरणाचा, तापमानाचा परीणाम होवून या ठिसूळ भागाची झीज होत जाते .  अशाप्रकारे डोंगराला भोक पडले की वारा , पाणी आत आत कोरत जाते आणि डोंगराच्या आरपार भोक पडले तर नेढे तयार होते.  अन्यथा गुहा तयार होते. या प्रक्रीयेचा वेग अनेक घटकांवर अवलंबून असल्याने अतिशय मंद असतो (वर्षाला एक सेंटीमीटर इतकी कमी झीजही होवू शकते.)  त्यामुळे अशाप्रकारे नेढे बनण्यासाठी हजारो वर्षे लागू शकतात. 

Chemdev

नेढ्या व्यतिरीक्त लाव्हा ट्युबज / टनेल लाव्हाचे बोगदे महाराष्ट्रात पाहाता येतात. जमिनीतून बाहेर येणारा लाव्हा वाहात असतांना बाहेरचा भाग हवेच्या संपर्कात आल्यामुळे थंड होतो आणि बोगद्या सारखा भाग तयार होतो. तप्त लाव्हा या बोगद्यातून वाहातो. कालांतराने लाव्हा वाहाणे बंद झाल्यावर उरलेला बोगदा मागे राहातो. अशा प्रकारचा लाव्हामुळे तयार झालेला बोगदा चेमदेव डोंगरावर पाहायला मिळतो.   

  चोमदेव डोंगरावर जाण्यासाठी  जटायू मंदिरसाठी प्रसिध्द असलेले टाकेद गाठावे. पुढे म्हैसवळण घाट चढून गेल्यावर सर्वत्र पवनचक्क्या दिसायला लागतात या भागात  बाराही महिने वारा वाहात असतो. त्यामुळे या भागात सर्व डोंगरंवर पवनचक्क्या दिसतात. म्हैसघाट चढून गेल्यावर कोकणवाडी, एकदरा या गावांना जाणारा रस्ता आहे. एकदरा गावातून एक रस्ता बितनगडच्या पायथ्याच्या बितका गावात जातो. दुसरा रस्ता पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पट्टावाडीत जातो. तर सरळ जाणारा रस्ता खिरवीरे गावात जातो.  सिन्नरहून ठाणगावमार्गे किंवा इगतपुरीहून टाकेदमार्गे खिरविरे गावात गेल्यास सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील महाकाळ पर्वताच्या पूर्वेस एकाकी अन पिंडीसारखा दिसणारा चेमदेव डोंगर सहज लक्ष वेधून घेतो. खिरविरेतून चेमदेव पर्यंत पक्की सडक आहे.  बितनगड तसेच पट्टा गडाच्या दक्षिणेला १२ कि.मी.वर अकोले तालुक्याच्या पश्चिम टोकाला एका डोंगरावर खिरवीर हे गाव वसले आहे. गावाच्या आसपास असंख्य वाड्या वस्त्या आहेत. या वाड्यांसाठी गावात दर मंगळवारी बाजार भरतो. या बाजारातूनच वाट चेमदेवकडे जाते. या वाटेवर जिल्हा परिषदेची शाळा आहे.या शाळेच्या मागेच चेमदेवचा डोंगर आहे. हा डोंगर उघडाबोडका भासतो. झाडी अशी नाहीच, 
Waghdev in route to Chemdev

Samadi ,Chemdev Dongar

Water Tank on Chemdev

चेमदेवला पोहोचण्यासाठी खिरवीरे गाव गाठावे लागते. हे गाव छोटेसे आहे. गाव पार केल्यावर एक कच्चा रस्ता धारवाडीत जातो. धारवाडीच्या मागे चेमेदेवचा डोंगर उभा आहे. पण चेमदेववर जाणारी पायवाट चेमदेवच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरुन आहे. चेमदेवचा डोंगर आणि त्याच्या बाजूच्या डोंगराच्या पायथ्याशी दाट झाडीचा पट्टा आहे. या झाडीतून चढत पायवाट दोन डोंगरांमधील खिंडीत पोहोचते. खिंडीत लाकडी फ़ळ्यांवर कोरलेले वाघदेव आहेत. शेंदूर फ़ासल्यामुळे आणि झीज झाल्यामुळे ते ओळखण्या पलिकडे गेलेले आहेत. वाघदेव पाहून खिंडीतल्या वार्‍याचा आनंद घेऊन चेमदेव डोंगरावर चढायला सुरुवात करावी. साधारणपणे १० मिनिटात आपण शेंदुर लावलेल्या दगडांपाशी येतो. येथून एक पायवाट माथ्याकडे तर उजवीकडे जाणारी पायवाट डोंगराला वळसा घालून पाण्याच्या खोदीव टाक्याकडे जाते. या टाक्यावरुन या डोंगराचा उपयोग टेहळणीची चौकी म्हणून होत असावा असे वाटते. या डोंगरावरुन उत्तरेला अवंधा, पट्टा आणि पूर्वेला बितनगड हे किल्ले आणि मोठा परीसर दृष्टीपथात येतो.

                                             चेमदेव लाव्हाचा बोगदा (ट्यूब) पाहाण्यासाठी व्हिडीओ प्ले करा

पाण्याचे टाके पाहून डोंगरमाथ्यावर असलेल्या कातळकड्यापाशी पोहोचल्यावर लाव्हाच्या बोगद्याचे उत्तरे कडील तोंड दिसते. यात चढून जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायर्‍या आहेत.  लाव्हाच्या बोगद्याचे तोंड ५ फ़ूट उंच आणि ३ फ़ूट रुंद आहे. येथून विरुध्द बाजूला असलेल्या दक्षिणेकडील बोगद्याच्या तोंडातून येणारा प्रकाश दिसत असतो. या प्रकाशाच्या रोखाने जाण्यासाठी आपल्याला गुढग्यावर रांगत जावे लागते. कारण बोगद्याच्या आतील भागाची उंची जेमतेम अडीच ते तीन फ़ूट आहे. साधारण पाच फूट गेल्यावर उजव्या (पूर्व) आणि डाव्या (पश्चिम) बाजूला बोगद्याची दोन तोंड आहेत.  या चार तोंड असलेल्या लाव्हा बोगद्याची रचना साधारणपणे (+) अधिक चिन्हासारखी आहे . या अधिक चिन्हाची चारही टोक मध्यभागी जिथे मिळतात तेथे गुहेची उंची ५ फूट आहे . त्यामुळे येथे वाकून उभे राहाता येते . उजव्या बाजूला चेमदेवची अनघड मूर्ती आहे . दगड एकमेकांवर रचून त्यावर शेंदूर लावलेला आहे .पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांचे हे ग्रामदैवत. मोठ्या भक्तिभावाने ते ह्या ग्रामदैवताची पुजा करतात. कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा आजही येथे प्रचलित आहे. 

    या चेमदेवच्या तांदळ्यामुळे  पूर्वेकडील तोंड झाकले गेलेले आहे.  उरलेली दोन तोंडे (दक्षिण आणि पश्चिम) अडीच ते तीन फूट उंचीची आणि निमुळती आहेत . त्यामुळे सडपातळ माणूस किंवा लहान मुलेच या तोंडापर्यंत पोहोचू शकतात . लाव्हा  ट्यूब पाहून झाल्यावर जवळ असणार्‍या टेपने त्याची माप घेतली. कच्चा नकाशा काढला. बोगद्यातून बाहेर आल्यावर नेढ्याच्या तोंडा जवळच या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी पायवाट आहे . या वाटेने ५ मिनिटात चेमदेव डोंगरच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते. सुळक्याच्या माथ्यावर निशान फडकत असुन त्यावरून निळवंडे धरण, पाबरगड, रतनगड, कळसुबाई, शेणित सुळका, महाकाळ पर्वत, विश्रामगड, औंढा, आडकिल्ला असा मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो.चेमदेव च्या पश्चिम पायथ्याशी देवगावात शुर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक आहे.
West & South face of Lava Tube 

Chemdev


Chemdev Measurements

AutoCAD Drawing by Deepali Sabnis

जाण्यासाठी :- 

मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून म्हैसघाट चढून कोकणवाडी, एकदरा या गावांना जाणारा रस्ता आहे. एकदरा गावातून एक रस्ता बितनगडच्या पायथ्याच्या बितका गावात जातो. दुसरा रस्ता पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पट्टावाडीत जातो. तर सरळ जाणारा रस्ता खिरवीरे गावात जातो. खिरवीरे पासून १.५ किमी मुख्य रस्त्यावरून गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता ३.५ किमीवरील  धारवाडी कडे जातो . (खिरवीरे ते धारवाडी अंतर ५ किमी ) धारवाडीतून चेमदेव डोंगर आणि त्याच्या डाव्या बाजूचा डोंगर यांच्या मधील खिंडीत जाणारी पायवाट आहे. या पायवाटेने १५ मिनिटे चढत गेल्यावर आपण खिंडीत पोहोचतो.

संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्गभ्रमंती नाशिकची - अमित बोरोले
३) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
४) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे]
५) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
६) www.durgbharai.in  हि वेबसाईट
७) https://samantfort.blogspot.com/2014/10/limestone-caves-in-chhattisgad.html ,https://adimculture.wordpress.com/2014/03/01/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1/, https://yorocks.wordpress.com/2013/11/18/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6/,  https://www.maayboli.com/node/45950    हे ब्लॉग
८) चोमदेव डोंगराची माहिती श्री. अमित सामंत,श्री. ईश्वर सहाने आणि दुर्ग २०२० च्या दिवाळी अंकातील श्री.अंकुर काळे यांच लिखाण










अपरिचित_दुर्ग_नवरानवरी

          सह्याद्री म्हणजे डोंगर-दऱ्या, उंच सुळके, घाटमाथे, कडे कपारे आणि अभेद्य असे गडकोट जे हिमालयालाही हिनवतात. याच सह्याद्रीत अनेक किल्ले आहे. काही परिचित तर काही अपरिचित त्याच अपरिचित किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे #किल्ला_नवरानवरी.
          #किल्ले_नवरानवरी हा आडवाटेवरील किल्ला आहे. महाराष्ट्रात अनेक सुळके आहे त्यात बरेचशे किल्ले हे नवरानवरी नावाने प्रसिध्द आहे. त्यापैकी हा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या कुशेगाव येथिल नवरानवरी किल्ला. हा किल्ला अपरिचित असल्यामुळ येथे क्वचित एखाद्या वाट सरू वळतो. किल्ला अपरिचित असल्यामुळ किल्ल्याचा दुर्गमपणा मात्र टिकून आहे. किल्ल्यावर जातांना आधी कुशेगावातील शेवटची वाडी म्हणजे पीपळवाडी लागते तिथून पुढे किल्ला सुरु होता. हा किल्ला नाशिकचे दुर्गअभ्यासक गिरीशजी टकले सर यानी प्रकाशत आणला. आधी किल्ल्याची माहिती मिळवन अवघड होत तसेच गूगल मैप वरही किल्ल्याचे लोकेशन नाही मिळत त्यामुळ किल्ल्याचे फोटो पण नाही मिळाले तरीही मी आणि माझे दोन नविन मित्र आम्ही किल्ल्यावर जाण्याचे ठरवले परंतु गिरीश सरांच्या pdf माहितीवरून आम्ही कुशेगाव माहिती असल्यामुळ आधी कुशेगाव गाठले तिथून गावातील लोकांच्या मदतीने किल्ल्या कोणता ते कळाल. मात्र कुठला ही गावकरी वाटाड्या म्हणून सोबत यायला तयार नव्हता. तरीही आम्ही गावकऱ्यांनी सांगितलेल्या पायवाटेने किल्ल्याकडे निघालो. २ टेकड्या आणि अनेक पाण्याचे वाहते झरे ओलांडत किल्ल्याच्या कातळ टप्यापर्यंत पोहचलो पण या टप्प्यापर्यंत पोहचन्या आधी अनेक ठिकाणी फसवे (Y) मार्ग लागतात त्यात किल्ल्याची वाट कोणती हे समझन पण अवघड परंतु अनुभवी भटक्यांना याची सवय असते. त्यामुळ आम्ही वाट काढत किल्ल्याच्या कातळ टप्प्यापर्यंत पोहचलो. कातळ टप्याच्या उजवीकडे काही अंतरावरच एक खिंड लागते जी आपल्याला किल्ल्यावर घेउन जाते हा किल्ल्याचा पुर्वीचा प्रवेश द्वार असावा. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मात्र आपली चढन संपते. समोरच प्रशस्त सपाट पठार आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर थोड समोर जावून आपल्या उजवीकडे एक साचपाण्याचे प्रशस्त तळ आहे. त्या तळ्याच्या बाजुलाच एक खडकात महादेवाची पिंड आणि तीला छत देण्यासाठी पिंडीच्या चार बाजूने असले खड्डे बघायला मिळते. ते बघून उजवीकडे १५ ते २० मिनिटाची पायपीट केल्यानंतर आपण चढ़उतार करावा लागतो. त्याच्या पुढे एक टेकडी लागते टी टेकडी चढल्या नंतर खडकात कोरलेली एक १० फुट रुंदी तोंड असलेल भुयारी टाके लागते. इथे प्राणी किंवा अपरिचित असल्यामुळ कुठलाही कचरा पोहचन अवघड त्यामुळ हे पाणी पिन्या योग्य आहे. किल्ल्याची उंची ही जवळपास ४००० फुट असून पठार हे रुंदीला ३०० ते ४०० मी असेल आणि लंबी २ ते ३ किमी पर्यंत असेल. दुर्ग-भटकंती, दुर्ग-अभ्यास  करतांना किल्ल्यावर अनेक गोष्टी आढलतात. किल्ल्यावर एक दगड रचलेला चौरस दिसतो परंतु तो कुठल्याही घराचा किंवा जोत्याचे अवशेष आहे अस वाटत नाही. पण काही ठिकाणी मात्र अवशेष आढळतात.
          किल्ल्यावरून आजुबाजुचा सर्व परिसर दिसतो जसे की ब्रम्हगिरि, अंजेनेरी किल्ला, घारगड, बहुला, कावनई असे अनेक किल्ले ही नजरेत भरतात तसेच वैतारना धरणही आपली नजर खेचून घेतो. किल्ल्याच्या भौगोलिक आणि त्याच्या खडेपणा वरून हा टेहाळनीसाठी असावा. परंतु या किल्ल्यावर विशेष संवर्धन आणि संशोधन होने गरजेचे आहे.
          किल्ल्याचा पसरलेला पसरा फिरून पुन्हा मागे फिरायचे आणि किल्ल्याच्या ज्वलंत आठवणी उरात भरुन परतीचा प्रवास सुरु करायचा......

गणेश सोनवणे.
दि.: ८ जुलै, २०१८

धन्यवाद......

गणेश सोनवणे
7773947925
सहकारी :- विकास भदे

https://goo.gl/maps/s78TNBax6vH2






























चेमदेव CHEMDEV CHEMDEO


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे भौगोलिक-ऐतिहासिक वारश्याने संपन्न भूमी. भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड, रतनगड, आजोबा पर्वत, अलंग-मदन-कुलंग, विश्रामगड आदी वैभवशाली गडकिल्ले, प्रवरा आडाळा मळगंगा नद्यांची सुपीक खोरी; भंडारदरा, घाटघर, निळवंडे धरणे, अकोले राजूर कोतूळ समशेरपूर आदी बाजारपेठा, अमृतेश्वर, टाहाकारी जगदंबा मंदिर तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, रंधा धबधबा, सांदण दरी आदी निसर्गाविष्कार प्रसिद्ध पावून वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची जत्राच असते.

परंतु याच परिसरात निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेले एक ठिकाण त्या मानाने खूपच उपेक्षित राहीले ते म्हणजे ”चेमदेव डोंगर”!

सिन्नरहून ठाणगावमार्गे किंवा इगतपुरीहून टाकेदमार्गे खिरविरे गावात गेल्यास सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील महाकाळ पर्वताच्या पूर्वेस एकाकी अन पिंडीसारखा दिसणारा चेमदेव डोंगर सहज लक्ष वेधून घेतो. खिरविरेतून चेमदेव पर्यंत पक्की सडक आहे.
डोंगराच्या पूर्वेस दोन टेकड्या असून त्यांच्या खिंडीतून पूर्वी दळणवळणाचा मार्ग होता. तशा खुणाही तिथे आढळतात. चेमदेववर वरकरणी मानवी वस्तीच्या खाणाखुणा दिसत नसल्या तरी त्यावरील खोदीव पाण्याचे टाके पाहता तिथे पहाऱ्याची चौकी असण्याची शक्यता आहे. चेमदेव अन टेकडीच्या घळीत वाघोबा दैवत असून वर चढून गेल्यावर आणखी एक वाघोबाचे स्थान आहे. तिथून उजवीकडे गेल्यास खडकात खोदलेले एक लहानसे पाण्याचे टाके आहे. परत माघारी फिरुन डोंगरावरील सुळक्याकडे आल्यावर एक अद्भुत निसर्गाविष्कार बघायला मिळतो.

या सुळक्यास दोन नेढेसदृश आरपार भुयारे (अंदाजे ३०-४०फूट लांब)असून ती एकमेकांना छेदून गेल्याने ✖ आकार तयार झाला आहे. त्यामुळे चारही दिशांना तोंड असलेल्या भुयाराला मध्यभागी केंद्र निर्माण झाला आहे. फक्त एकच व्यक्ती गुडघ्यावर चालत जाऊ शकेल इतक्यातच रुंदीच्या या भुयारात पश्चिमेकडील बाजूला मध्यभागी चेमदेवाचा शेंदूर फासलेला तांदळा आहे. भुयारात प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील तोंडाकडे दगडी पायर्‍या आहेत.
या भुयाराच्या चारही तोंडातून आजूबाजूचा परिसर बघण्याची मजा काही औरच आहे. तसेच यात चारही दिशांनी येणाऱ्या वाऱ्याची झुळूक नक्कीच प्रसन्न करून जाते. पावसाळ्यात तर यातून वेगाने वाहणारे धुके अनुभवने म्हणजे पर्वणीच ठरेल.

सुळक्याच्या माथ्यावर निशान फडकत असुन त्यावरून निळवंडे धरण, पाबरगड, रतनगड, कळसुबाई, शेणित सुळका, महाकाळ पर्वत, विश्रामगड, औंढा, आडकिल्ला असा मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो.
चेमदेव च्या पश्चिम पायथ्याशी देवगावात शुर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक आहे.

स्तरीय खडकाच्या चिरांना वाऱ्याच्या वेगामुळे क्षरण होऊन ही भुयारे तयार असावीत असेच वाटते.

असा हा नैसर्गिक अविष्कार भटके गिरीप्रेमी पर्यटक यांनी एकदा तरी अनुभवावा असाच आहे.

लेखन ईश्वर सहाने Contact : 8390607203


https://www.akolemaza.com/chemdev-chemdeo-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5/


चेमदेव डोंगर उतरुन पुन्हा खिरवीरे गाठले . पाऊस अजूनही चालू होता. त्यामुळे ट्रेकर्स लोकांचे अमृत म्हणजे चहा पिण्याची तल्लफ़ आली होती. पण खिरवीरे गावात चहा मिळाला नाही. एव्हाना १२ वाजून गेले होते. एकदरा मार्गे  बितका हे बितनगडाच्या पायथ्याचे गाव गाठले. वाटेत दोन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या त्यामुळे रस्त्यावर राडारोडा पसरला होता. गावात गेल्यावर कळले की जुलैला झालेल्या पावसात दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे गावात एसटी येत नाही. जुलै पासून प्रशासनाने किंवा गावकरी दोघेही उदासिन असल्याने ज्यांच्याकडे मोटारसायकली आहेत. ते त्या चिखलातून राडारोड्यातून गाड्या चालवत होते आणि बाकीचे गावकरी डोंगर चढून आपले गाव गाठत होते.
Bitangad

बितनवाडीतली दोन मुले आमच्या बरोबर गडावर यायला तयार झाडी. गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर रस्त्यात दरड कोसळली होती. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग बंद झाला होता. गाडी तिथेच उभी करुन चालायला सुरुवात केली. याभागात वाहाणारा जोरदार वारा आणि पाऊस यामुळे हुडहुडी भरत होती. समोर पिरॅमिडच्या आकाराचा बितनगडाचा ताशिव डोंगर दिसत होता. थोड्यावेळात चढण सुरु झाली आम्ही किल्ल्या खालच्या जंगलात पोहोचलो आणि वारा थांबला. या ठिकाणी शेंदुर लावलेले काही दगड आहेत. यांना स्थानिक लोक माऊली या नावाने ओळखतात. पुढे पायवाट खडी चढण चढत कातळ टप्प्यापाशी पोहोचते. वाटेत वनखात्याने खड्डे खोदून लावलेली झाडे होती. आमच्या बरोबर आलेल्या मुलांनी उन्हाळ्यात हे खड्डे वनखात्यासाठी खोदले होते आणि पावसाळ्यात झाडे लावली होती. त्यामुळे त्यांना प्रत्येक झाडाचे नाव माहिती होते. वाटेतल्या झुडूपात हात घालून ते तोंडली सारखी दिसणारी फ़ळ काढून खात होते. त्या फ़ळाला ते मेका म्हणतात. त्या जंगली तोंडल्यांवर बारीक काटेरी लव होती. आम्हालाही मेका खायचा सतत आग्रह चालू होता. पण किल्ला चढतांना सहसा अनोळखी गोष्टी खाऊ नयेत असा नियम पाळत असल्याने आम्ही त्यांना किल्ला उतरल्यावर मेका खाऊ असे सांगितले. 

मेका 
Rock cut steps , Bitangad

कातळ टप्प्याच्या खाली पायवाटेच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. कातळात कोरलेल्या पायर्‍या अरुंद आहेत. पायर्‍या चढण्या उतरण्यासाठी कातळात जागोजागी खोबण्या केलेल्या आहेत. त्याच्या आधार घेऊन पायर्‍या चढता येतात. पण दरीची बाजू संपूर्ण उघडी (Expose) असल्याने काळजीपूर्वक पायर्‍या चढाव्या - उतरव्या लागतात. पायर्‍या संपल्यावर काही अंतर चढून गेल्यावर एक दोन खांबांवर तोललेली प्रशस्त गुहा आहे. गुहा पाहून पुढे गेल्यावर एक पाण्याचे फ़ुटलेले टाके आहे. टाक्यापुढे कारवीची दाट झाडी आहे. कारवी साधारणपणे ८ वर्षांनी एकदाच फ़ुलते , तिच्या बीया जमिनीवर पडतात आणि मग मरण पावते. पुढच्या पावसाळ्यात जमिनीवर पडलेल्या बियांपासून नवीन कारवी तयार होते. सुकलेल्या कारव्यांचे दांडे घराच्या भिंती बांधण्यासाठी, छत शाकारण्यासाठी वापरले जातात. २०१९ च्या ऑक्टोबर मध्ये इथली कारवी फ़ुलली होती. सगळीकडे टपोर्‍या कळ्या दिसत होत्या. थोडीच फ़ुले फ़ुलली होती. एक दोन दिवसात कारवीचे हे रान जांभळ्या रंगाने फ़ुलणार होते. कारवीच्या राना मधून पायवाटेने चढत किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचा माथा लहान आहे. किल्ल्यावरुन भरपूर मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन आपण चढलो त्याच्या विरुध्द दिशेला खाली उतरुन गेल्यावर पाण्याचे कोरडे टाक आहे. ते पाहून परत माथ्यावर येऊन गड उतरण्यास सुरुवात केली. गावात आमच्या वाटाड्या मित्रांना सोडले आणि परतीचा प्रवास चालू केला.

कारवी 


Rock cut cave Bitangad


चेमदेव डोंगर हा मुंबईहून अर्ध्या दिवसाचा ट्रेक असल्याने उरलेल्या अर्ध्या दिवसात पट्टा किल्ला किंवा बितनगडला भेट देता येते .





केनियातील सुस्वा माऊंटन या लाव्हा ट्यूब्जमुळे झालेल्या गुहेत केलेल्या  Off beat ट्रेक बद्दल वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा....   













 एकदरा मार्गे  बितका हे बितनगडाच्या पायथ्याचे गाव गाठले. वाटेत दोन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या त्यामुळे रस्त्यावर राडारोडा पसरला होता. गावात गेल्यावर कळले की जुलैला झालेल्या पावसात दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे गावात एसटी येत नाही. जुलै पासून प्रशासनाने किंवा गावकरी दोघेही उदासिन असल्याने ज्यांच्याकडे मोटारसायकली आहेत. ते त्या चिखलातून राडारोड्यातून गाड्या चालवत होते आणि बाकीचे गावकरी डोंगर चढून आपले गाव गाठत होते.

बितनवाडीतली दोन मुले आमच्या बरोबर गडावर यायला तयार झाडी. गावाच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर रस्त्यात दरड कोसळली होती. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग बंद झाला होता. गाडी तिथेच उभी करुन चालायला सुरुवात केली. याभागात वाहाणारा जोरदार वारा आणि पाऊस यामुळे हुडहुडी भरत होती. समोर पिरॅमिडच्या आकाराचा बितनगडाचा ताशिव डोंगर दिसत होता. थोड्यावेळात चढण सुरु झाली आम्ही किल्ल्या खालच्या जंगलात पोहोचलो आणि वारा थांबला. या ठिकाणी शेंदुर लावलेले काही दगड आहेत. यांना स्थानिक लोक माऊली या नावाने ओळखतात. पुढे पायवाट खडी चढण चढत कातळ टप्प्यापाशी पोहोचते. वाटेत वनखात्याने खड्डे खोदून लावलेली झाडे होती. आमच्या बरोबर आलेल्या मुलांनी उन्हाळ्यात हे खड्डे वनखात्यासाठी खोदले होते आणि पावसाळ्यात झाडे लावली होती. त्यामुळे त्यांना प्रत्येक झाडाचे नाव माहिती होते. वाटेतल्या झुडूपात हात घालून ते तोंडली सारखी दिसणारी फ़ळ काढून खात होते. त्या फ़ळाला ते मेका म्हणतात. त्या जंगली तोंडल्यांवर बारीक काटेरी लव होती. आम्हालाही मेका खायचा सतत आग्रह चालू होता. पण किल्ला चढतांना सहसा अनोळखी गोष्टी खाऊ नयेत असा नियम पाळत असल्याने आम्ही त्यांना किल्ला उतरल्यावर मेका खाऊ असे सांगितले. 

कातळ टप्प्याच्या खाली पायवाटेच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. कातळात कोरलेल्या पायर्‍या अरुंद आहेत. पायर्‍या चढण्या उतरण्यासाठी कातळात जागोजागी खोबण्या केलेल्या आहेत. त्याच्या आधार घेऊन पायर्‍या चढता येतात. पण दरीची बाजू संपूर्ण उघडी (Expose) असल्याने काळजीपूर्वक पायर्‍या चढाव्या - उतरव्या लागतात. पायर्‍या संपल्यावर काही अंतर चढून गेल्यावर एक दोन खांबांवर तोललेली प्रशस्त गुहा आहे. गुहा पाहून पुढे गेल्यावर एक पाण्याचे फ़ुटलेले टाके आहे. टाक्यापुढे कारवीची दाट झाडी आहे. कारवी साधारणपणे ८ वर्षांनी एकदाच फ़ुलते , तिच्या बीया जमिनीवर पडतात आणि मग मरण पावते. पुढच्या पावसाळ्यात जमिनीवर पडलेल्या बियांपासून नवीन कारवी तयार होते. सुकलेल्या कारव्यांचे दांडे घराच्या भिंती बांधण्यासाठी, छत शाकारण्यासाठी वापरले जातात. २०१९ च्या ऑक्टोबर मध्ये इथली कारवी फ़ुलली होती. सगळीकडे टपोर्‍या कळ्या दिसत होत्या. थोडीच फ़ुले फ़ुलली होती. एक दोन दिवसात कारवीचे हे रान जांभळ्या रंगाने फ़ुलणार होते. कारवीच्या राना मधून पायवाटेने चढत किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचा माथा लहान आहे. किल्ल्यावरुन भरपूर मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन आपण चढलो त्याच्या विरुध्द दिशेला खाली उतरुन गेल्यावर पाण्याचे कोरडे टाक आहे. ते पाहून परत माथ्यावर येऊन गड उतरण्यास सुरुवात केली. गावात आमच्या वाटाड्या मित्रांना सोडले आणि परतीचा प्रवास चालू केला.
कारवी 

चेमदेव डोंगर हा मुंबईहून अर्ध्या दिवसाचा ट्रेक असल्याने उरलेल्या अर्ध्या दिवसात पट्टा किल्ला किंवा बितनगडला भेट देता येते .

इथल्या लोकांसाठी ‘बितंगा’ म्हणूनच ओळख.. बितनवाडी मुळातच बितंगाच्या खांद्यावर वसलेली.. त्यामुळे बितंगाची चढाई फारशी उंचीची वाटत नाही.. इथे कोरलेल्या पायर्‍या या गडाचे वैशिष्टय ! पकडीसाठी खोबणीची सोय असली तर पावसात येथील चढाई नक्कीच थरारक होउ शकते.. या पायर्‍या दोन-तीन टप्प्यात आहेत.
समोर बितंगा नि मागे कळसूबाई व अलंग-मदन-कुलंग


अरुंद पायर्‍या
इंद्रदेवांचे कष्ट
पायर्‍या चढताना दिसणारा अप्रतिम नजारा

(
पहिला चढ पार केला की उजवीकडे पाण्याचे चौकोनी भुयारी टाके लागते.. पुढे पायर्‍यांनी चढून गेले की दोन खांब असलेली गुहा लागते.. पाच-सहाजण सहज राहू शकतील इतकी मोठी.. पायर्‍यांनी अजुन वरती गेले की पाण्याच्या काही टाक्या आढळतात.. पुढे पायर्‍या संपल्या की सरळ मातीच्या घसरणीचे चढण लागते.. हे पार केले की थेट माथ्यावर ! माथा अगदीच अरुंद.. किल्ल्याचे अवशेष वगैरे काही नाही पण सभोवतालच्या भव्यदिव्य ङोंगररांगा मनाला सहज भुरळ पाडतात..
इथून दिसणारी खोल दरी थेट काळजात घुसते.. शेणत डोंगराची उंची वेडावून सोडते.. त्याच्या माथ्यावरील पवनचक्क्यांचा तुरा अगदी डौलाने डुलताना दिसतो.. तर दुसरीकडे कळसुबाई, अलंग-मदन-कुलंग हे त्रिकुट अगदी हाकेच्या अंतरावर भासते.. इथून नक्कीच कळसुबाईच्या डोंगरावर जाणारी वाट असावी असा अंदाज होता.. आम्ही नवरात्रीला याच वाटेने कळसुआईच्या दर्शनाला जातो असे सुनिलने सांगत आमचा अंदाज खरा ठरवला ! अ‍ॅनिने तर माझ्या पार्टनिरशिपने पुढच्या नवरात्रीसाठी ह्या ट्रेकचा प्लॅन पण आखला !

खादाडी-फोटोसेशन आटपून आम्ही लगेच उतरायला घेतले.. पण आता बितंगाच्या मागच्या बाजूने.. फारसे सोप्पे नव्हते.. मातीचा घसारा.. त्यात सुक्या गवताची भर नि थेट उतरण तेव्हा घसरगुंडीची कसरत करुन उतरणे भाग पडले.. हाच काय तो संपुर्ण ट्रेकमधला थोडाफार थरार ! पण ती चिल्लर पार्टी अगदी नेहमीचाच खेळ समजून टणाटण घसरगुंडीच्या उडया मारत गेले.. फारच मस्ती चालली होती.. एकाने तर किटकाला पकडून त्याचा ‘किर्रकिर्र’ आवाज कसा सुरु असतो ते दाखवले.. शिवाय छोटया तेंडलीच्या आकाराची ‘मेका’ हे रानफळ पण चाखायला दिले.. पिवळ्या फुलांच्या वेलींना येणारी ही मेका चवीला आंबट पण मस्तच.. एक नविन रानमेवा चाखायला मिळाले त्यातच आनंद.. !
मेका (फोटो by रो.मा)

– –
धडकी भरवणारा उतार
पण हे तर अव्वल नंबर !!
बितंगाला वळसा घालेपर्यंत पाण्याच्या अजुन तीन – चार सुक्या टाक्या नजरेस पडल्या.. सगळीकडे वाढलेल्या गवताचे साम्राज्य होते… इथेही वाटेत एक गुहा लागते.. विस्ताराने छोटा असूनही बितंगावर त्यामानाने पाण्याच्या बर्‍याच टाक्या आहेत. पण बहुतांशी सुकलेल्या नि बुजलेल्या..ह्या गडाचादेखिल पहारा ठेवण्यासाठी वापर केला जात असावा.. उत्तुंग डोंगररांगेत छोटा वाटणारा हा बितंगा त्याच्या उत्तम स्थानामुळे प्रिय वाटतोच.. पायथ्याची बितनवाडीदेखील मस्त.. शेळ्यामेंढया नि गुरांना घेउन वसलेली छोटीशी वस्ती.. इथे मुक्काम करण्यासाठी शाळा तर आहेच पण एक हनुमानाचे मंदीरदेखील उत्तम आहे..

– –
घरासमोरील लाडीळवाणे वासरु:
– –
बच्चाकंपनीचा निरोप घेउन पाटीलमामांकडे पोहोचलो.. त्यांच्याकडून ‘खवा’ तर विकत घेतलाच शिवाय बळजबरीने हातात ‘मानधन’ ठेवून त्यांचाही निरोप घेतला..


          बितागा गावात पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले असतील. गाडीत सिटांच्या संख्येपेक्षा जास्त माणसे असल्यामुळे मी मागच्या डिक्कीत हातपाय आवळून बॅगांच्या सानिध्यात निवांत मागे उडणारा धुराळा पाहत होतो. सकाळी दोन रग्गड किल्ले पाहून झाल्यामुळे बितनगड प्लॅनमधून काढून त्याच्या जागेवर दुसरा प्लॅन आखला होता. पण हौसले बुलंद असल्याने बितनगडच्या पायथ्याशी तरी जाऊन येऊ या इराद्याने इथं पोहोचलो होतो. किल्ला करायचा की नाही करायचा की नाही ह्या मनस्थितीत सर्व जण असताना मी ट्रेकिंगचे बूट चढवून कॅमेरा खांद्याला लटकवला, बॅगेतून पाणीही घ्या असा धमकीवजा हुकूम सोडून तिथल्याच दोन पोरांना सोबत घेऊन तडक किल्ल्याकडे धूम ठोकली. सूर्यास्ताला अजून दोन तास शिल्लक होते. तेवढाच वेळ आमच्याकडे होता.
            डोक्यात आडवे तिडवे नियोजन केले आणि वेळेचे गणित बांधले. समजा वेळेच्या बाहेर एखादी गोष्ट गेलीच तर तडक माघार घ्यायच्या तयारीनेच झपाझप पावलं उचलली. हळूहळू एकेक जण मागे मागे येऊ लागला. बितागा गावातून अर्जुन आणि संजय असे दोघे सोबतीला घेतले तेव्हाच कळले कि आज महाभारत घडणार. अर्जुन पेढेकर जितका शांत दिसत होता त्यापेक्षा जास्त हुशार - चुणचुणीत बोलायला तरबेज होता हे मला पहिल्या दहा मिनिटातच कळले. किल्ला हा माझा अन त्याचाही आवडता विषय असल्याने दोघांचीही काही क्षणातच गट्टी जमली. बितागा गाव मागे सोडून पश्चिमेकडे साधारण बैलगाडी जाईल असा रस्ता आहे. टोकेरी काळ्या दगड रस्त्यात टाकल्याने कार किंवा मोठी गाडी आणणे गैरसोयीचे. गावातून किल्ला दिसत नाही हे एक वैशिष्ट्य. गावसोडून ५ मिनिटांच्या डाव्या बाजूच्या वळसा घेऊन बितनगडाने दर्शन दिले आणि हा किल्ला आपल्या वेळेच्या गणितात बसेल अशी खात्री झाली. जोश आणखीन वाढला. 
         किल्ल्याच्या उजव्या बाजूची धार गडावर नेत असल्याने अर्जुनने आम्हाला झाडाझुडपातून किल्ल्याच्या पायथ्याला आणले. मागून विशाल आणि कल्पेश ह्यांनी मला कधीच ओव्हरटेक केले आणि थेट चढाईला भिडले.  अमर आणि मी थोडेसे फोफावलोच. झिकझॅक करीत सरळ वर चढलेली वाट एका टप्प्याशी येऊन थांबते.
         कातळकोरीव पायर्यांनी दिल खुश झाले. गोल फिरणाऱ्या देखण्या कमी उंचीच्या खोबण्या असलेल्या पायर्यांनी चढताना थोडासा सावध पवित्राच घेतला. अर्जुन गुहा दाखवण्यासाठी आमची वाट पाहत बसला होता. वरती आलो आणि मी दमलेल्याचा काडीमात्र विचार न करता आधी गुहा पाहायला चला असा आदेश दिला. त्याच दमात गुहा पाहून घेतली आणि मग ५ मिनिटे विश्रांती घेतली. अर्जुन आम्हाला मागे टाकून एव्हाना माथ्यावर पोहचला होता. मागे मागे मीही निघालो. संजय मागची तुकडी घेवून येत होता. अजून दोन पाण्याचे जोड टाकी माथ्यावर आहेत त्यानंतरचा माथा मग फक्त गवताने भरलेला. पण एक अफाट पसरलेला सह्याद्रीचा पॅनोरमा पाहून केलेल्या कष्टाचं चीज झालं. माथ्यावरून संजयला विचारले टाकेद किती लांब आहे.. हे काय.. समोरचे. अर्जुन बोट करून दाखीवले सोबत आजूबाजूची साऱ्या गावांची नावे टपाटप सांगितली. माझ्या डोक्यावरून टाकेद सोडून बाकी नावे कधीच उडून गेली.   किल्ल्याचा माथा तसा लहानच. साहजिकच याचाही वापर टेहळणी साठीच. कळसूबाईचे टोक धुक्यात लपलेले असले तरी इथली डोंगररांग मनाला भुरळ पडणारी. त्याच्या मागे अलंग मदन कुलंग हि वातावरण स्पष्ट नसल्याने दिसत नव्हते.  माथ्यावर फार वेळ न घेता गड उतरायला घेतला.
                 सूर्यनारायण आता हळू हळू अस्ताला निघत होता आणि आम्हीही गड उतरत होतो. चेहऱ्यावर असंख्य समाधानाचे भाव तरळत होते. पुन्हा गावात आलो तेव्हा घडयाळात ६. ४५ झाले होते. थोडी फार आवराआवरी करून तिथल्या गावच्या आजोबांचे तसेच अर्जुन आणि संजयचे आभार मानले. थकलेल्या जीवांना माठातील थंडगार पाणी पाजताना ...

आडवाटेवरचा बित्तनगड

 जो जो जयाचा घेतला गुण । तो म्या गुरु केला जाण ।

 गुरूसी पडले अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे  ।।

 आज आषाढ पौर्णिमा / व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. माझ्या जीवनातील ज्ञात अज्ञात अशा सर्वच गुरूंना माझा नमस्कार.


सखा सह्याद्री…!

 पावसाळा म्हटला  की डोळ्यांसमोर येतो तो रम्य निसर्ग… पावसासाठी आसुसलेल्या धरतीवर, वरूण राजा बरसलेला असतो. जमिनीतून इवलेसे कोंब माना वर काढू लागतात. सृष्टीमध्ये हिरवा रंग तर असा पसरलेला असतो, जसे काही नुकत्याच चित्र काढायला शिकलेल्या मुलाने हिरव्या रंगाची मुक्त उधळण केलेली आहे.  डोंगर कपारींमधून वाहणाऱ्या पाण्याच्या ओघोळांचे शुभ्र प्रपातांमधे रूपांतर होते. आपली देखील छत्र्या, रेनकोट शोधण्याची धावपळ चालू होते. मग विरंगुळा म्हणून आपसूकच आपले मन निसर्गाकडे वळते.

अशा प्रसन्न वातावरणात भटकंतीसाठी आम्ही आडवाटेवरील बित्तनगडाकडे आमचा मोर्चा वळवला. बित्तनगडाचा परिसर शिवस्पर्शाने पावन झालेला आहे; पट्टा किल्ल्याच्या रांगेतील हा गड गनिमी हल्ल्यासाठी कायम तयार असल्यासारखा भासतो. औंढा – पट्टा या किल्ल्यापासून सुरु झालेली डोंगर रांग पुढे थेट अलंग, मदन, कुलंग या दुर्ग त्रिकुटापर्यंत येऊन थांबलीय, पण यात बित्तनगड मात्र दिसतच नाही; तो एखाद्या पाठीराख्यासारखा भासतो. इतिहासातही बित्तनगडाचा उल्लेख क्वचितच आढळतो, त्यामुळेच की काय ट्रेकर्स मंडळी औंढा – पट्टा पर्यंत येतात पण बाजूच्याच बित्तनगडाकडे सहसा कोणी फिरकत देखील नाही. म्हणूनच, आजचा ब्लॉग प्रपंच केवळ बित्तनगडासाठी…

बित्तनगडावरून पट्टाकिल्ला. 

अकरा भिडूंसह रविवारी सकाळी सहा वाजता दोन गाड्या नाशिकहून घोटी मार्गे सर्वतीर्थ टाकेद ला पोहचल्या. त्याठिकाणी पहिला ब्रेक झाल्यावर अप्रतिम अशा म्हैसवळण घाट मार्गाने निघायचे. घाट संपताच उजवा रस्ता बित्तनगडाकडे तर डावा रस्ता पट्टागडाकडे जातो, आपण उजवा रस्ता धरायचा. नुकतेच पावसाचे आगमन झालेले असल्यामुळे वातावरण आल्हादायक होते, गारव्याची पुसटशी जाणीव होऊ लागली होती, झाडांच्या छटा बदलू लागल्या होत्या. गर्द झाडीतील वळणावळणाची वाट मन मोहवून घेत होती. बित्तनवाडीही (बिताकावाडी) अगदीच टुमदार. फार – फार तर ४५-५० घरांची वाडी. इथपर्यंत येऊन देखील बित्तनगडाचे दर्शन होतच नाही. मग वाडीतच गाड्या पार्क करायच्या, वाटाड्या सोबत घ्यायचा आणि निघायचे बित्तनगडाच्या भेटीला…

बित्तनवाडी 
बित्तनगडाचे प्रथम दर्शन 

कातळ कोरीव पायऱ्या 

वाडीतून बाहेर पडलो की छोटा जंगलपट्टा लागतो आणि साधारण वीस मिनिटे चालल्यानंतर बित्तनगडाचे पहिले दर्शन होते, मग गडाला डाव्या हाताला ठेवत चालत रहायचे. अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी येतो. नागमोडी वळणाऱ्या चढाईनंतर गडाच्या पूर्व बाजूला असणाऱ्या कातळ कोरीव पायऱ्यांशी पोहचतो. या पायऱ्या काही ठिकाणी तुटलेल्या असल्यामुळे जरा जपूनच चढावे लागते. पायऱ्या चढतांना मध्येच एके ठिकाणी कातळात कोरलेली छोटी गुहा लागते. सर्व पायऱ्या चढून गेल्यावर आपण थेट गडाच्या गुहेसमोर येतो. ही गुहा सुस्थितीत असून त्यात दोन खांब आहेत.



पायऱ्या. 

गुहेच्या डावीकडची वाट टाक्यांपाशी जाते. ही वाट फारच निसरडी असल्याने तिकडून न जाणेच उत्तम. दुसरी वाट गुहेच्या डोक्यावरून थेट गडाच्या माथ्याकडे जाते. ही वाट धरायची. थोडे अंतर चढल्यानंतर फुटके टाके लागते, ते बरेच जमिनीत बुजलेले आहे. आताशा भूक देखील लागत होती, त्यामुळे इथेच कातळावर बसून आम्ही डब्यांवर यथेच्छ ताव मारला आणि तेथुनच पुढे जाणाऱ्या वाटेने गडमाथा गाठला. माथ्याचा भाग चिंचोळा असून, चढ उताराचा आहे. पश्चिमेला माहांकाळ डोंगर आणि शेणीत सुळका लक्ष वेधीत होते, तर समोरच शिखरस्वामिनी ‘कळसूबाई’ मनात भरत होती. उत्तरेला टाकेद चा परिसर लक्ष वेधीत होता.

डबे खाण्याच्या तयारीत 

 बित्तनगडाच्या शेवटच्या कड्यावर पाय सोडून सह्याद्रीचा भव्य दिव्य नजराणा न्याहाळताना मन आपसुकच सुखावत होते. मन त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या शांततेचा मागोवा घेऊ लागले. असे वाटले की गरुडाचे पंख लेवून अनादी, अनंत, अभेद्य सह्याद्रीचे सुखचित्र पुन्हा पुन्हा नजरेत भरून घ्यावे, एकदा, दोनदा…अनेकदा.

आयुष्याच्या खडतर वाटांवर ताठपणे वावरायला शिकवणारा माझा श्रेष्ठ गुरु म्हणजे सह्याद्री. माझ्या प्रत्येक अडचणीचे समाधान माझ्या ह्या गुरु कडे आहे. आयुष्यात मी कमी पडतेय असं वाटतं तेव्हा माझा गुरु मला माझ्यातल्या कणखरपणाची जाणीव करून देतो. खूप काही कमावलं असं वाटतं तेव्हा तो मला पुन्हा जमिनीवर आणतो. त्याचे आकाशाशी भिडणारे ताशीव कडे, मला आयुष्यात अशीच प्रगती करण्याचे सुचवितात. त्याच्या कुशीत गेल्यावर मी कधीच निराश होऊन परतत नाही. फक्त माझ्याच नाही तर प्रत्येक ट्रेकरच्या पाठीशी सह्याद्री गुरु म्हणून सदैव उभा असतो. माझ्या ह्या गुरूने माझं मन अगदी आनंदाने वेडावून टाकलंय. त्याच्या सोबतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्याच्याशी आणि त्याच्या सानिध्यात भेटलेल्यांशी माझे अतूट असे नाते आहे. आयुष्यात आलेल्या प्रत्येकाशी जुळवून घ्यायला मला माझ्या गुरुनेच शिकवलंय. ह्या सुखाचे वर्णन करायला माझ्याकडे अचूकसे शब्दच नाहीत. माझ्या मनावर आनंदाचे असंख्य तरंग उमटविणाऱ्या माझ्या सख्या सह्याद्रीस माझे साष्टांग नमन.

भव्य सह्याद्री.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटलेल्या माझ्या असंख्य गुरूंना वंदन…!!!

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा…!!!

आनंद…!
( फोटो बाय नाना )
माझा गुरु… अभेद्य सह्याद्री.
गवतफुला रे गवतफुला…!
माझे सर्वस्व…!

ट्रेक दिनांक :- १ जुलै २०१८

                     रविवार

उंची :- १०८५ मी. (३५५८ फूट)

डोंगररांग :- पट्टा डोंगररांग

प्रकार :- गिरिदुर्ग

पायथ्याचे गाव :- बितनवाडी ( बीताकावाडी ) , टाकेद.

तालुका :- सिन्नर

जाण्यासाठी उत्तम कालावधी :- जून ते मार्च

सोबत :- संजय अमृतकर, भोजराज गायकवाड, श्री व सौ थेटे, कैलास शिंदे, किरण काळे, सोहन काळे, जयंत, स्मिता, ऋतुजा व क्षितीजा धामणे.

प्रकाशन दिनांक :- गुरुपौर्णिमा

                          २७ जुलै २०१८

 ©ऋतुजा जयंत धामणे

 लेखन/ फोटो सर्व हक्क राखीव.




बितनगड


प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नगर

उंची : ३७१५ फुट

श्रेणी : कठीण

अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगर रांगेच्या पूर्वेला औंढा, पट्टा, आड आणि बितंगगड हे किल्ले वसले आहेत. बितनगड हा किल्ला कळसूबाई व पट्टागड यांच्या मधील पट्टयात आहे. घोटी- भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. टाकेद गावातून म्हैसमाळ घाटमार्गे एकदरा फाटा ९ किमी अंतरावर तर एकदरा फाट्यापासून बितंगगडाच्या पायथ्याचे बितंगवाडी गाव ५ किमीवर आहे. बितंगवाडी या गावाजवळ असणारा हा किल्ला तसा स्थानिकांच्या दृष्टीने वंचित आहे. गावात या किल्ल्याविषयी कुणाला फारशी माहित नाही पण गड दाखविण्यासाठी वाटाडे मात्र मिळतात. गावातून किल्ल्याकडे जाणारी प्रशस्त वाट आहे पण वाटेच्या अखेरच्या टप्प्यात शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ४००० फुट तर पायथ्यापासुन साधारण १२०० फुट आहे. गडाचा आकार त्रिकोणी असुन गडाचे एकुण क्षेत्रफळ ३ एकरपेक्षा कमी आहे. गड माथ्यावर जाण्यासाठी १००पेक्षा जास्त कातळात कोरलेल्या पाय-या चढाव्या लागतात. गडाच्या पाय-या सुरु होतात तिथे जवळच उजव्या हाताला कातळात एक भुयार आहे. या भुयारात रांगत जावे लागते. आत जाताना सोबत विजेरी असणे आवश्यक आहे. अर्धवट खोदलेल्या या भुयाराच्या शेवटी पाण्याचे टाके आहे. असेच एक भुयार किल्ल्याच्या विरुद्ध टोकाला किल्ल्याबाहेर आहे. या भुयाराचे तोंड मोठे असुन आतील भागात मात्र रांगत जावे लागते. या भुयाराच्या आत टोकाशी जमिनीलगत खोदलेली २०x२०x १५ आकाराची खोली आहे. या खोलीच्या तळातील भागात अजुन एका भुयाराचे तोंड दिसते. किल्ल्यावर दोन भुयाराशिवाय सातवाहनकालीन दोन खांबी मोठी गुहा आणि सहा पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत पण एकाही टाक्यात पिण्यायोग्य पाणी नाही. यातील दोन टाक्याकडे जाता येत नाही त्या केवळ माथ्यावरून पहाता येतात. या टाक्याकडे जाणारी वाट सुरुंग लावून उध्वस्त केली आहे. गावकऱ्यांनी एका कपारीत झऱ्याचे पाणी अडवुन पाण्याची तात्पुरती सोय केली आहे पण पण ती फक्त जानेवारीपर्यंत. गडावरील दोन खांबी गुहेत ८-१० माणसे सहज राहु शकतात पण हि गुहा वापरात नाही शिवाय जानेवारी नंतर गडावर पाण्याची सोय नाही. गडाच्या माथ्यावर जाताना काही उद्‌ध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसुन येतात. गडाची बरीच पडझड झाली असुन एका ठिकाणी तुरळक तटबंदी दिसते. किल्ल्याचा माथा तसा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा. बितंगवाडीतून गडाच्या माथ्यावर येण्यास दीड तास लागतो. किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग, औंढा, पट्टा, आड, म्हसोबाचा डोंगर आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो. गड उतरताना सरळ खाली न जाता गडाच्या टोकावरील खिंडीच्या दिशेला जाऊन तेथे असलेले भुयार तसेच खिंडीतील लाकडावरील व्याघ्रशिल्प पहाता येते. किल्ला चढायला कठीण नाही पण खडकात खोदलेल्या पायऱ्या पावसाळ्यात शेवाळामुळे निसरड्या होत असल्याने व गडावर मोठया प्रमाणात गवत वाढत असल्याने पावसाळ्यात गडावर जाणे टाळावे. बितंगवाडीतील हनुमानाच्या देवळात ३० जणांची राहण्याची सोय होऊ शकते. गावात विनंती केल्यास घरगुती जेवणाची सोय होते. इतिहासाचा मागोवा घेतला असता या गडाबाबत फारशा नोंदी आढळत नाहीत पण डिसेंबर १६८२च्या एका पत्रात याची नोंद आढळते. रहुल्लाखानाने औरंगझेबला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो शत्रूच्या प्रदेशात बितंगगडाच्या वाडीस आग लाऊन ती जाळली यावरून १६८२ च्या सुमारास हा किल्ला मराठयांच्या ताब्यात असावा.
© Suresh Nimbalkar

पायथ्याल्या आल्यावर बित्तनगडच्या रस्त्याची चौकशी केली... बित्तंगासाठी गाडी रस्ता आहे. थेट बित्तनवाडी पर्यंत... टाकेदला जाणारा घाट न उतरता सरळ एकदरे गावाच्या आधी बित्तंगाचा फाटा लागतो. फाट्या पासुन ६ कि.मी. वर बित्तनवाडी आहे. बित्तंगाची वाट बर्‍या पैकी जंगलातून जाणारी आहे. रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हतं.. बर्‍याच वेळाने मागुन एक बाईकवाला आला. त्याच्याकडे बित्तंगा विषयी चौकशी केली असता त्यांनेच आमची उलट तपासणी सुरु केली. पण त्याचा फायदाही झाला. ते बित्तंगाचे पोलीस पाटिल निघाले. मग त्यांनीच संध्याकाळी आमच्या रहाण्याची सोय केली.

वाडीत पोहचे पर्यंत मिट्ट अंधार झाला होता. पोलीस पाटलांच्या अंगणात चटई टाकून चंद्रोदयाचा नजार पाहण्यात सगळे दंग झालो. पाटलांनी चहा पाणी दिल्यावर जेवणासाठी गळ घातली. पण आम्ही त्यांना चक्क नकार दिला. त्यांनीच मग अंगणात आम्हाला जेवणासाठी चुल पेटवुन दिली. सुप, पापड, सांबार राईस, राजमा असा रेडी टू ईटचा प्रकार पाहुन पाटिलांना 'आ' वासला. मस्त ढेकर देत सगळे शाळेच्या पडवीत निद्रिस्त झालो.

सकाळचा चहा आणि मॅगीचा नाष्टा करुन बित्तनगडच्या वाटेला लागलो. बित्तनगड हा बित्तंगवाडीच्या मागच्या बाजुला असल्याने गावातुन दिसत नाही. वाडीला वळसा मारुन पुढे गेल्यावर बित्तनगडचा खडा चढ दिसू लागतो.

प्रचि ३८

रविवार असल्याने आमच्या सोबत गावातील उनाड पोरांच टोकळंही गडवारीला निघालं. त्यांचा रिंगण फिरवण्याच्या खेळात काही काळ आम्हिही स्वतःला हरवुन बसलो. गडाच्या पायथ्या पर्यंत बैलगाडीची वाट आहे. गडाच्या उजविकडचा खडा चढ चढुन वर गेल्यावर कड्यात खोदलेलं पाण्याच चौकोनी टाकं सोबत आलेल्या पाटलांच्या सुनिलनं दाखवलं. साधारण शरिरयष्टीचा माणूस त्या चौकटीतून सरपटत आज जाऊ शकेल इतक ते अरुंद होतं.

प्रचि ३८

थोड वर गेल्या वर कातळात पिण्याच्या पाण्याच छोटस टाकं दिसलं. गड माथ्यावर भगवा डौलात फडकत होता. माथ्यावरुन पश्चिमेला परसलेली कळसुबाईची डोंगर रांग स्पष्ट दिसते. टाकेद वरुन वर येणार्‍या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्लाच्या उपयोग होत असावा. आजमितीस गडावर तटबंदी वा इतर कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत.

उतरताना सुनीलने घसरगुंडीची बिकट वाट पकडली आणि आमची चांगलीच त्रेंधातिरिपिट उडाली. घसरडी माती आणि गवतावरुन बिचकत उतरताना सगळ्यांचीच फजिती होत होती. सोबत आलेल्या लहानग्यांनी तर कमालच केली. वाटेत वेलीवर उगवलेली मेका नावाची काकडी सारखी चवीला असलेली फळे खाण्याचा सपाटाच लावला. दोन चार फळं आम्ही सुद्धा चाखुन पाहिली.

सुर्व्या डोक्यावर यायच्या आत आम्ही गड उतरुन वाडीत आलो. सुनीलने दाखवलेल्या वाटेतील एका डब्याकावर शुचिर्भुत होऊन टाकेदला निघालो.

सीतेचे अपहरण करणार्‍या रावणाला जटायुने रोखण्याचा प्रयन्त केला आणि ज्या ठिकणी तो धारातिर्थी पडला ते ठिकाण म्हणजे टाकेद. येथील जटायु मंदिरात श्रीरामाने जटायुला बिलगलेली करुण शिल्पकृती पहावयास मिळाली. मंदिराच्या परिसरात श्रीराम आणि दत्त महाराजांचे देऊळ आहे.

प्रचि ३९

दर्शन घेऊन निघालो तेव्हा जठराग्नी पेटला होता. मग काय गाडीने भरधाव निघालो घोटीच्या दिशेने. इगतपुरी नंतर वाटेत मयुर हॉटेलात सामिष भोजनावर यथेच्छ ताव मारण्यात आला. 













No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...