Wednesday, July 12, 2023

सिन्नर

महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील एक नगर व त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. त्याचा सिंदिनगर, सिंदिनेर, सेऊणपूर, श्रीनगर वगैरे नावांनी उल्लेख आढळतो.  पुणे— नासिक रस्त्यावर नासिकच्या आग्नेयीस सु. २७ किमी.वर सिन्नर वसले आहे. पौराणिक काळात मौनीनाथांच्या चरित्रात या शहराला ब्रह्मपुरी म्हटले आहे. राज्यात सातवाहनांनी जी काही शहरे वसविली त्यापैकी एक सीरीनगर म्हणजे सिन्नर होय. यानंतरच्या काळात राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांचाही प्रभाव या शहरावर राहिला आहे.मध्ययुगात नगराभोवती मातीची तटबंदी होती पण ती आता जवळजवळ नामशेष झाली आहे. सिन्नरचा उल्लेख १०६९ च्या ताम्रपटात सिंदिनेर असा आढळतो. गवळी राजा राव शिंगुणी याने हे नगर वसविले, अशी एक परंपरागत कथा आहे. तोच ताम्रपटातील सेऊनेन्डू असावा. याचा अंतर्भाव सेऊण देशात होत असल्यामुळे त्यावर यादव (सेऊण) वंशाची (११८५— १३१८) सत्ता होती व बाराव्या शतकापर्यंत सिन्नर (श्रीनगर) हे यादवांच्या राजधानीचे स्थळ होते. महाराष्ट्राधीश असे स्वतःला अभिमानपूर्वक म्हणवून घेणारे एकमेव राजघराणे यादवांचे होय. त्या घराण्याने सुमारे पाचशे वर्षें (शके ७७१ – इसवी सन ८५० ते शके १२३३ – इसवी सन १३११) महाराष्ट्रावर राज्य केले. वैभवशाली राष्ट्र म्हणून त्या राज्याचा लौकिक आहे. यादव राजवटीतच ‘मराठी’ भाषा समृद्ध होऊन अनेकोत्तम साहित्यकृतींनी मराठीचे साहित्यभांडार अलंकृत झाले.

   यादव राजे स्वतःस अभिमानाने श्रीकृष्णाचे वंशज म्हणवून घेत. यादवकुळाचा प्रारंभ पौराणिक दृष्टीने श्रीकृष्ण – प्रद्युम्न (मदन) – अनिरुद्ध – वज्र – प्रतिबाहु – सुबाहु असा आहे. पण ऐतिहासिक दृष्ट्या पहिला ज्ञात यादवराजा म्हणजे ‘द्दढप्रहार’. (शके ७७२ – इसवी सन ८५० ते शके ८०२ – इसवी सन ८८०). द्दढप्रहाराने स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर त्याचे स्वतःचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात निर्माण केले. ‘चंद्रादित्यपूर’(चांदवड, जिल्हा नासिक) ही त्याच्या राजधानीची पहिली नगरी.
नासिक जिल्हा, खानदेश व नगर जिल्ह्याचा काही भाग याला मध्ययुगात ‘सेऊण देश’ असे म्हणत. सेऊणदेश ही यादवांची पहिली भूमी. यादव हे गुजरातेतील द्वारकेहून आले. तसा उल्लेख जिनप्रभु ह्या जैन तीर्थंकारांनी लिहिलेल्या ‘नासिक्यकल्प’ ह्या ग्रंथात आलेला आहे. त्यात असे म्हटले आहे, की ‘द्वारकेच्या वज्रकुमार नावाच्या यादव क्षत्रियाच्या स्त्रीला जैन तीर्थकार चंद्रप्रभसाधु यांनी आश्रय दिला, तिचा पुत्र ‘द्दढप्रहार’ हा सामर्थ्यवान योद्धा झाला. त्याला लोकांनी ‘तलारपद’ (नगररक्षक, कोतवाल) दिले.’ नगररक्षक ‘द्दढप्रहार’च पुढे स्वपराक्रमावर स्वतंत्र राजा झाला.

   यादवांचे सुमारे बत्तीस कोरीव लेख उपलब्ध आहेत. यादवांचा इतिहास समजावून घेण्याची साधने म्हणजे यादवराजांनी केलेले ताम्रपट, कोरलेले शीलालेख, हेमाद्री पंडिताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या संस्कृत ग्रंथातील ‘राजप्रशस्ती’ हा खंड व मध्ययुगीन मराठी ग्रंथसंपदा (उदाहरणार्थ, लीळाचरित्र, स्थानपोथी, ज्ञानेश्वरी).
द्दढप्रहाराने त्याच्या राज्याचा विस्तार चंद्रादित्यपूर (चांदवड) नगराच्या परिसरापासून थेट अंजनेरीपर्यंत (तालुका त्र्यंबकेश्वर) व चांदवडच्या दक्षिणेस सिंदीनेरपर्यंत (सिन्नर) केला. त्याच्या नंतर राजपदावर आला त्याचा मुलगा सेऊणचंद्र (प्रथम). तो वडिलांसारखाच पराक्रमी निघाला. त्याने त्याच्या राज्याच्या कक्षा आश्वी, संगमनेर (जिल्हा नगर)पर्यंत विस्तारल्या व त्याची राजधानी राज्यकारभाराच्या सोयीसाठी चंद्रादित्यपुराहून ‘सिंदीनेर’ म्हणून त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या नगरात आणली. सिन्नरचा प्राचीन साहित्यात ‘श्रीनगर’ असा उल्लेख आहे. सेऊणचंद्र (प्रथम) - (शके ८०२ ते ८२२) पासून त्याच्या नंतर धाडियप्प, भिल्लन (प्रथम), श्रीराज, वादुगी, धाडियप्प (द्वितीय), भिल्लम (द्वितीय), वेसुगी, अर्जुन, भिल्लम (तृतिय), वादुगी (द्वितीय), वेसुगी, भिल्लम (चतुर्थ), सेऊणचंद्र (द्वितीय), सिंघणदेव, मल्लुगी, भिल्लम (पंचम) याच्यापर्यंत (शके ११०७ ते १११५) अशी सुमारे तीनशे वर्षें यादवांची राजधानी ‘सिन्नर’ येथे होती. भिल्लम (पाचवा) याने यादवांची राजधानी शके ११०७ मध्ये सिन्नरहून देवगिरी (आताचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथे नेली व प्रसिद्ध देवगिरीच्या किल्ल्यावरून महाराष्ट्राचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.
    यादवांचे राज्य उत्तरेस थेट नर्मदेपासून दक्षिणेस कृष्णा-कावेरीपर्यंत व पूर्वेस थेट नागपूर (विदर्भप्रांत) ते पश्चिमेस महिकावती (ठाणे, कोंकणप्रांत) पर्यंत विस्तारले होते. यादव राजांनी संपत्ती, वैभव, भूविस्तार निर्माण करून वैभवशाली राष्ट्र म्हणून महाराष्ट्रास हिंदुस्थानच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, वापी (बारव), प्रचंड सैन्य, सोने, मोती, राजवस्त्रे यांचे वर्णन हा स्वतंत्र ग्रंथाचा, लेखनाचा विषय आहे. राजधानी देवगिरी व देवगिरीचा किल्ला या संदर्भातही विस्तृत लेखन झालेले आहे.
     सिन्नर शहराच्या दक्षिणेस ‘शिव’ नदी आहे. त्या शिवनदीकाठी सिंदीची झाडे होती. ती सद्य काळात तुरळक आढळतात. सिंदीच्या बनाशेजारी उत्तर बाजूस उंचावर वसलेले गाव म्हणजे ‘सिंदर’ होय. ‘गावठा’ म्हणून सिन्नरमध्ये जो भाग ओळखला जातो तो भाग म्हणजे सिन्नरची मूळ वस्ती होय. सेऊणचंद्राने ‘सेऊणपुरा’ या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वसती निर्माण केली असे वसई व आश्वी येथील ताम्रपटात म्हटले आहे.
श्रीमत्सेऊणचंद्रनाम नृवरतस्मादभूदभमिपः नित्यंदेशपदिधराजविषये स्वं नाम संपादनयन्।
येनाकारि पुरं च सेऊणपुरं श्रीसिंदीनेरे वरे तत्पुत्रः कुलदीपको गुणानिधी श्रीधाडियप्पस्त्रतः।।
असे अश्वी ताम्रपटात (शके १०२०) म्हटले आहे.
    यादवांना ते सेऊणदेशाचे आहेत याचा अभिमान होता. शिवनदीचा उत्तर काठ ते सरस्वतीनदीचा दक्षिण काठ; तसेच, पूर्वेस सरस्वती नदी ते पश्चिमेस थेट शिवाजीनगर (बसस्टँड जवळचे) तेथपर्यंत पश्चिमेस असलेल्या त्यावेळच्या पारापर्यंत प्राचीन सिन्नर नगरीचा विस्तार होता. स्वतंत्र पेठा (पुर), वसाहती (राजवाडे, सामंतांचे राजवाडे, सैन्यतळ, हत्ती, घोडे यांचे हत्तीखाने व तबेले) यांनी यादवांची राजधानी गजबजलेली होती. त्याचे वर्णन ‘लीळाचरित्र’ या मराठी भाषेतील ग्रंथात (शके १२००) म्हाईमभट सराळेकर यांनी केलेले आहे.
   ‘श्रीनगर’मधील श्री म्हणजे संपत्ती, वैभव. श्रीनगर म्हणजे संपत्ती व वैभव यांनी संपन्न असलेले नगर. ‘ततः राजा नजराजधानी मधिष्ठितं श्रीनगरं गरीयः’ असे व्रतखंडाच्या राजप्रशस्ती श्लोक – २२ मध्ये सिन्नरला म्हटलेले आहे.
    यादव राजे सुसंस्कृत व प्रजाहितदक्ष होते. त्यांनी राज्यविस्ताराबरोबरच भव्य राजप्रासाद, किल्ले, मठ, मंदिरे, वापी (बारव), तडाग (तळे) यांच्या निर्मितीकडे लक्ष दिले. ते राजे गेले पण त्यांनी, त्यांच्या सामंतांनी निर्माण केलेल्या वास्तू त्यांच्या कार्याची आठवण देत आहेत.
सतराव्या शतकात मोगलांची सत्ता या नगरावर होती व त्यांच्या चौदा ठाण्यांपैकी हे एक लष्करी ठाणे होते. अमृतराव देशमुख हा त्याचा मुख्य सरदार होता आणि त्यानेच ही मातीची तटबंदी बांधली व नदीला धरण बांधले. त्याच्या वाड्याचे अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत. मराठ्यांनी त्यावर १७९० मध्ये वर्चस्व मिळविले. कुठलेही शहर समृद्ध होते ते सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समृद्धीच्या समन्वयाने. पेशवेकालीन सिन्नर असेच वेगळेपण जपणारे शहर आहे, पेशवे काळात सिन्नरच्या कुशीत सर्व समाज आणि धर्म गुण्यागोविंद्याने नांदत होते. वस्त्रोद्योगामध्ये मुस्लिम धर्मीयांचे असणारे योगदान, धातूकाम, काचकाम यामध्ये विशेषत्वाचे बांगड्यांची निर्मिती, खाटिक व्यवसाय, शेती, पानांची शेती आदी व्यवसायांनी या शहराला आर्थिक समृद्धता दिली. पेशवाईच्या अवनतीनंतर (१८१८) ते इंग्रजी अंमलाखाली स्वातंत्र्यपूर्व काळात होते.या शहराचे वर्णन सांगणारे अनेक पौराणिक, सातवाहनकालीन, राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांशी निगडित असणारे संदर्भ आहेत. पेशवेकालीन समृद्धीची परंपरा सांगणारेदेखील भरपूर संदर्भ उपलब्ध आहेत. एका ऐतिहासिक संदर्भ जपणाऱ्या बखरीमध्ये सिन्नरचे वर्णण लेखकाने चक्क 'लिटल पुणे' असे केले आहे यावरून या शहराने जपलेल्या निसर्गाची कल्पना यावी. सिन्नरसारख्या शहराने केवळ जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्राचेदेखील प्रतिनिधीत्व केले आहे. ते या अर्थाने, की सातवाहनांच्या काळापासून पेशव्यांच्या कालखंडातही मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक अभिसरणाचा वारसा या भौगोलिक परिसरास लाभला आहे.
सिन्नर म्हणले कि आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे बीडी. बिडी ओढणे किंवा धुम्रपान करणे हे कितीही हानीकारक असले तरी या उद्योगाने सिन्नरचे चित्र बदलून टाकले आहे. वास्तविक या भागात ना तंबाखु उगवते ना तेंदुची पाने होतात. तरीही १८९५ साली शिवाजी चौकात श्री. बाळाजी गणपत वाजे यांनी बिडी व्यवसायाची मुहुर्तमेढ रोवली. आता सिन्नरमधील साठ-सत्तर कारखान्यात सिन्नर बिडी उद्योग, मे.कोंबडा छाप बिडी, मे.भिकुसा यमासा, वगैरे ब्रँडच्या बिड्या तयार होतात. 

महानुभाव पंथाच्या सिन्नरमधील खुणा :-

 भगवान श्रीचक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ स्थापन केला. महानुभाव पंथ महाराष्ट्रात एक हजार वर्षांपूर्वी उगम पावला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. महानुभाव पंथ श्रीदत्तात्रेय प्रभू यांच्यापासून म्हणजे कृतयुगापासून चालत आलेला आहे असे मानतात. भगवान श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेयप्रभु यांच्यापासून ज्ञानशक्ती स्वीकार केलेले चक्रपाणी महाराज शके १०४३ (इ.स. ११२१), श्रीगोविंदप्रभु शके ११०९ (इ.स. ११८७) व श्रीचक्रधरस्वामी शके ११४२ (इ.स. १२२०) अशी अवतार परंपरा आहे. त्यांना ‘पंचकृष्ण’ असे म्हणतात. त्या पंचकृष्णांचा निवास जेथे झाला, ते आसनस्थ जेथे झाले त्या जागांस ‘स्थान’ असे म्हणतात. ती स्थाने पवित्र मानली गेली आहेत. लोकांनी तेथे महानुभाव पंथातील मंदिरे बांधली आहेत.
    श्रीचक्रधर स्वामींचा उपदेश, त्यांचे विचार सातशे वर्षापूर्वीच्या बोलीभाषेत लिहिलेल्या एका ग्रथांत आहेत. त्या ग्रंथाला ‘लिळाचरित्र’ असे संबोधतात. सत्य, अहिंसा, समता आणि ममता यांची दिव्य शिकवण देणारे महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान श्रीचक्रधर स्वामी यांचे मराठी भाषेवरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांचे पशुपक्ष्यांवर, प्राण्यांवर प्रेम होते. त्यांनी महाराष्ट्रभर पायी प्रवास करून गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर असलेल्या गावांना भेटी दिल्या. ते वेगवेगळ्या खेड्यापाड्यांत गेले. तेथील गरीब, साध्याभोळ्या स्त्री-पुरूषांमध्ये मिसळले;  त्यांच्या सुखदुखाशी समरस झाले.
    भगवान श्रीचक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील. हरिपाल देव हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म शके १११६ ( इ.स. ११९४ ) मध्ये झाला. ते गुजरातमधील भरूच येथील विशालदेव प्रधान यांचे पुत्र, मालनदेवी हे त्यांच्या आईचे नाव. हरिपाल देव हा राजकुमार बालवयापासून शूर, धाडसी होता. महाराष्ट्रातील सिंघणदेव या यादवराजाने जेव्हा गुजरातवर स्वारी केली तेव्हा त्या युद्धात हरिपाल देवाने भाग घेतला होता. त्याने राज्यकारभारात प्राविण्य संपादन केले होते. त्यांनी श्रीगोविंदप्रभू यांच्याकडून ज्ञानशक्तीचा,जीवोद्धरण शक्तीचा स्वीकार केला व एकांतवास सुरू केला. ते सालबर्डी (ता. मोर्शी) च्या घनदाट जंगलात बारा वर्षें राहिले. त्यांनी राजा भर्तृहरीची भावजय मुक्ताबाई हिची पूजा स्वीकारली. त्यामुळे त्यांचे शरीर सदैव तरूण व तजेलदार दिसे. नंतर ते गोंडमध्ये गेले. त्यांनी आंध्रप्रदेश व कर्नाटक प्रांतांतही संचार केला.
    स्वामींचे विचार अभिनव होते. त्यांनी म्हटले, ‘परमेश्वर व जीव हे परस्परांपासून भिन्न आहेत. परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ असून, जीवाचा उद्धार करणारा आहे. यासाठी जीवाने अनन्यभावाने परमेश्वराची भक्ती करावी. त्यासाठी यज्ञयाग आदी कर्मकांडाची आवश्यकता नाही.’ स्वामी हे जरी परमेश्वराचे अवतार होते तरी ते त्यांच्या संचारकाळात जनसामन्यांमध्ये मिसळले  त्यांच्या सुखदु:खाशी एकरूप झाले -त्यांची काळजी वाहिली. ते सर्वांचे हितकर्ता झाले. त्यांनी मराठी आणि महाराष्ट्र यावर प्रेम केले. त्यांनी मनुष्याप्रमाणे प्राणिमात्रांची काळजी घेतली.
   चक्रधरस्वामींमुळेच महानुभाव पंथातील लोकांनी चार हजारपर्यंतची ग्रंथनिर्मिती केली. व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, हे तत्त्व महानुभाव पंथात आहे. त्या पंथांची श्रद्धा वैदिक धर्मावर नसली तरी महानुभाव पंथीयांना वैदिक धर्माबद्दल आस्था आहे. महानुभावांचा चातुर्वर्ण्यावर एक सामाजिक गरज म्हणून विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख काही नियम म्हणजे प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत.






    महानुभाव पंथाची काही चरणांकित तीर्थस्थाने नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातही आहे. महानुभाव पंथाच्या ‘पंचकृष्णां’पैकी चक्रधर स्वामी यांचा चरणस्पर्श सिन्नर तालुक्यात चौदा चौकाचा वाडा, भोजनतळ, पट्टीशाळा, गोंदेश्वर मंदिर, महानुभाव मंदिर (खोपडी) या स्थानी झाला. तेथे त्यांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. श्रीचक्रधरस्वामी व भिल्लममठ ही मंदिरसदृश पक्क्या दगडांमध्ये बांधलेली वास्तू सिन्नर शहरात चौदाचौकाचा वाडा (राजे फत्तेसिंहवाडा) या भागात आहे. महानुभव पंथ संस्थापक भगवान श्रीचक्रधरस्वामी यांचे या भिल्लममठात शके १९९०-९१ मध्ये दहा महिने वास्तव्य झाले. त्यामुळे ते महानुभाव पंथीयांचे देवस्थान ठरले आहे. वास्तू उत्तराभिमुख आहे. ती महानुभव श्रीदत्तमंदिर किंवा श्रीकृष्णमंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीनगरी भिलमठी अवस्थान (लीळा पूर्वार्ध – २३६) या लीळेत ते वर्णन आहे. मंदिराचा भव्य गाभारा व दगडी खांबांची ओसरी अशी ती भक्कम वास्तू यादव राजा, भिल्लम (तृतीय) याने शके ९४८ (इसवी सन १०२६) मध्ये निर्माण केली. त्याच्या नावावरून ते मंदिर ‘भिल्लममठ’ या नावाने प्रसिद्ध आहे. मठाला चारही बाजूंनी दगडी परकोट होता व पूर्वाभिमुख प्रवेशद्वार होते. त्याच मठात मराठी भाषेची आद्यस्त्री कवयित्री महदंबा व महानुभव पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांचे रामसगाव (जिल्हा जालना) येथून आगमन झाले. त्यांनी शके ११९१ मध्ये चैत्र महिन्यांत ‘दवणा’ ह्या सुगंधी झाडाची पाने, फुले श्रीचक्रधरस्वामींना अर्पण करून ‘दमणक पर्व’ साजरे केले.
     श्रीचक्रधरस्वामींनी केलेले तत्त्वनिरूपण, त्यांच्या दहा महिन्यांच्या काळातील लीळा यांचे वर्णन मराठी भाषेचा आद्य गद्य ग्रंथ लीळाचरित्र यामध्ये (पूर्वार्ध लीळा क्रमांक २३५ ते २४६) आलेले आहे; तसेच, त्या काळात स्वामी सिन्नरच्या परिसरातील ज्या ज्या ठिकाणी (मठ, मंदिरे आदी) गेले त्यांचे वर्णन ‘स्थानपोथी’ (शके १२७५) या ग्रंथात आलेले आहे. भिल्लममठ माद्री (शके ११९२ ते १२३५) याच्या आधीपासून होता. त्यामुळे त्याला हेमाडपंथी देऊळ म्हणता येत नाही. ‘भिल्लममठ’ किंवा श्रीदत्तमंदिर सुस्थितीत असून त्या मूळ वास्तूस धक्का न लावता सभामंडपासह मंदिरनिर्मिती करण्यात आली आहे. ते मंदिर श्रीचक्रधरस्वामींच्या निवासाने, आसनाने व लीळांनी पावन झाले आहे. तेथे स्थान निर्देशक ओटे (पंथीय भाषेत स्थान) असून मुख्य स्थानाच्या जागी श्रीकृष्णमूर्तीची स्थापना केलेली आहे. भिल्लममठाचे पट्टीशाळेत (दगडी पडवी) शके १४१५ मध्ये कवी संतोषमुनी यांनी ‘रुक्मिणीस्वयंवर’ या ग्रंथाची पूर्णता केली.
गोंदेश्वर मंदिर ही ‘पंचायतन’ पद्धतीची भव्य वास्तू यादवांचे सामंत गोविंदराज यांनी शके ९९० च्या दरम्यान निर्माण केलेली आहे. गोंदेश्वर मंदिर हे सिन्नरचे वैभव आहे. शांत, एकांतस्थळी असलेल्या या मंदिरात श्रीचक्रधरस्वामी गेले होते. चौकात डावीकडे त्यांचे आसन झाले व मंदिरापुढे असलेल्या मंदिराच्या निर्मितीची कथा (पद्मेश्वर मंदिर, आताचे मुक्तेश्वर मंदिर, सिन्नर-शिर्डी रस्ता) त्यांनी भक्तांना सांगितलेली आहे (पूर्वार्ध लीळा क्रमांक २४५ गोंदेश्वरापुढे पद्मेश्वरू कथन).
      सरस्वती नदीच्या दक्षिण काठावर असलेले आवेश्वर मंदिर प्राचीन पूर्वाभिमुख मंदिर, हल्ली ऐश्वरेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या उत्तर पट्टीशाळेत श्रीचक्रधारस्वामींचे आसन झालेले आहे.
यादवकालीन चतुर्विधांचे मंदिर या नावाची प्राचीन वास्तू सरस्वती नदीच्या दक्षिणकाठी होती. चतुर्विधाचा मठ मातीत दबलेला होता. तेथे स्वामींचे आसन झालेले आहे. मठाच्या ठिकाणी ‘पट्टीशाळा मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर व चतुर्विधाच्या मठाची उर्वरित वास्तू आहे.
    वैजनाथाचे मंदिर ही यादवकालीन वास्तू शीव नदीच्या दक्षिण काठावर होती. तेथे स्वामींचा तीन दिवस निवास झालेला आहे. मूळ वास्तूच्या चौकाच्या ठिकाणी ‘भोजनता मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर आहे. तेथेच यादवसम्राट महादेवराय यादव हा पुढे देवगिरीहून मुद्दाम घराण्याच्या मुळच्या राजधानीच्या ठिकाणी आला होता (शके ११९०). त्याचा उल्लेख लीळाचरित्र, पूर्वार्ध लीळा क्रमांक २३७ मध्ये आलेला आहे. महादेवराय यादवाने श्रीचक्रधरस्वामींच्या दर्शनाच्या हेतूने भिल्लममठात त्याचा सेवक पाठवला होता. तेव्हा स्वामी पट्टीशाळेत खांबाजवळ गुजराती भाषेत त्या सेवकाशी बोलले. तो पवित्र खांब वंदनीय झाला! तेथे व जेथे श्रीनगरदेवाचार्य व महदाईसा यांना स्वामींचे प्रथम दर्शन झाले त्या ठिकाणी पवित्र स्थानांचे ओटे आहेत. भिल्लममठ ही पवित्र वास्तू व श्रीचक्रधरस्वामींचे ‘महास्थान’ यांना वंदन करण्यासाठी भारतभरातून भक्त येतात.
   खोपडी येथील महानुभाव मंदिरात चक्रधर स्वामींचा काल्पनिक चेहरा बनवला गेला आहे. तो चेहरा चौथऱ्याजवळच आहे. तेथे चैत्र पौर्णिमेच्या वेळी तीन दिवस जत्रा असते. तीन दिवसांच्या त्या जत्रेत त्या पुतळ्याची देऊळ गाडीवरून जवळच्या गावांत मिरवणूक काढली जाते. मंदिरात जे भाविक दर्शनासाठी येतात ते स्वामींच्या चरणी विडा अर्पण करतात. त्या विड्यात दान, सुपारी आणि नारळ या वस्तू असतात. महानुभाव पंथातील लोकांना मांसाहार व कोठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास मनाई आहे.
चिंचोली (तालुका सिन्नर) हे गाव सेऊणचंद्र  - द्वितीय (शके ९७२ ते १००२) याने सर्वदेवाचार्य या राजगुरूस दान दिले होते. त्या दानाचे व चिंचोली गावाच्या चतुःसीमांचे वर्णन वसईचा ताम्रपट यात आलेले आहे.
‘सकलपरिग्रह विदितं सिंहिग्रामद्वादसके चिंचुली ग्रामः प्रदत्तः तस्य आघाटनानि पूर्विदग्भागे डोंगर दत्तं... दक्षिणे चिंचाला नाम तडागः।
नइऋत्ये वडगम्भाग्राम।
पश्चिमे तलेठिलीपर्यंतः उत्तरोत्तु सिंसि ग्रामीयडोंगर दत्तं तथा वटवृक्षर्चः’
     वडगाव (पिंगळा, तालुका सिन्नर), शिंदे (तालुका जिल्हा नासिक) ही गावे चिंचोली गावाच्या भोवताली आहेत. ताम्रपटामुळे त्या गावांचेही प्राचीनत्व लक्षात येते.
यादवकाळापासून सिन्नरशी असलेले महानुभाव पंथाचे अनुबंध पुढेही टिकले. केशिराजबास यांनी लीळाचरित्रातील लीळांचे ‘रत्नमाळास्तोत्र’ या नावाने संस्कृतमध्ये काव्यरूपाने शके १२१० मध्ये वर्णन केले. मुरारीमल विद्वांस या आचार्यांची सिन्नर येथे एका गुजराती स्त्री भक्ताने शके १५०० मध्ये पूजा केली असे ‘वृद्धाचार’ या ग्रंथात वर्णन आलेले आहे.
    श्रीचक्रधरस्वामींनी सिंघण, कृष्णदेवराय, महादेवराय, आमणदेव, रामदेव अशा पाच राजांची राजवट (शके ११४० ते ११९६) पाहिलेली आहे. स्वामींचा त्या राजांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. कृष्णदेव (शके १९८०) व महादेव (शके ११८३) यानी तर स्वामींची आदरपूर्वक पूजा केलेली आहे. श्रीचक्रधरस्वामी व त्यांचा महानुभव पंथ अशा रीतीने यादवकाळाशी संबंधित आहे.
   शिव आणि सरस्वती या नद्यांमुळे शहराच्या आसमंतातील जमीन ओलिताखाली आली आहे. या दोन नद्यांचा संगम जवळच आहे. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गहू , बाजरी, तंबाखू, ऊस, भुईमुग ही काही प्रमुख पिके होत. याशिवाय विड्याची पाने व भात यांचे उत्पादन घेतले जाते. सिन्नर हे जिल्ह्यातील एक प्रमुख विणकाम केंद्र असून शहरात अनेक यंत्रमाग आहेत. त्यांपैकी काही विणकरांनी सहकारी उद्योगसमूह स्थापन केले आहेत. एके काळी शहरात विडी वळण्याचा उद्योग तेजीत होता. विड्या वळण्याचे पाचहून अधिक कारखाने असून, त्यावेळी अनेकांना रोजगार उपलब्ध झाला होता. येथील विड्या कर्नाटक व गोव्यात विशेष प्रसिद्घ होत्या.







मुक्तेश्वर मंदीर





चितळेश्वर महादेव मंदीर

   सिन्नरकडे सांस्कृतिक दृष्टीने बघायचे झाल्यास शेजारीच असणाऱ्या नाशिक या तीर्थक्षेत्राचा मोठा प्रभाव या शहरावर पडलेला आढळून येतो. श्री गोंदेश्वरापासून अनेक मंदिरांचे अस्तित्व यामुळे या काळात असल्याचे दिसून येते. या शहरात असणाऱ्या मंदिरांवर शैव पंथीयांचाही मोठा प्रभाव असल्याच्या खुणा पेशवेकालीन वाटचालीत पुढे येतात. पेशव्यांच्या राजवटीत धर्म आणि सणोत्सव परंपरांना विशेष महत्त्व असल्याने या शहरावरही मोठा प्रभाव दिसून येतो. यामुळे दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासारखे उत्सव असोत किंवा देवीचे उत्सव असोत मोठ्या उत्साहाने ते येथे साजरे होत असत. याशिवाय मुस्लिम धर्मीयांचे ईद आणि मोहर्रमदेखील उत्साहात साजरे होत असत. या दोन्ही धर्मीयांसाठी खर्चासाठी प्रशासकीय तरतूद त्या काळात होती. याशिवाय भोजन समारंभांवरदेखील मोठा भर या काळात असलेला आढळून येतो.
शहरात लहान मोठी काही मंदिरे असून त्यांपैकी दोन मंदिरे प्रेक्षणीय आहेत आणि एक भव्य गणपतीची मूर्ती आहे. 
या मंदिरांपैकी गोंडेश्वराचे मंदिर हे शिवपंचायतन असून, एका प्रशस्त चौथऱ्याच्या मध्यभागी मुख्य मंदिर आहे व त्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या बाजूंना विष्णू, गणेश, पार्वती व सूर्य या देवतांची उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत विभागले असून त्याला तीन द्वारे आहेत. ते गोविंदराज या यादव राजाने बाराव्या शतकात बांधले. मंदिर नागरशैलीत— विशेषतः माळव्यात प्रचलित असणाऱ्या ‘भूमिज’ या उपशैलीत— बांधले आहे. ही शैली मूळ नागर आणि द्राविड यांहून काहीशी भिन्न असून तीत स्थानिक वैशिष्ट्ये डोकावतात. शिखराची घडण आणि मंदिराच्या पायाची आखणी यांत कलाकाराने समतोल साधला आहे. यादवकालीन शिखरांपैकी हे एक उभट पिरॅमिडप्रमाणे आकाशाकडे झेपावणारे सुरेख, भव्य व नमुनेदार शिखर असून छायाप्रकाशाचा समतोल त्यात साधला आहे मात्र शिखराचा वरचा भाग तुटला आहे. स्तंभ व मंडोवरावर काही देवदेवतांच्या मूर्ती आढळतात. 
शहराच्या वायव्येला ऐश्वरेश्वर मंदिर असून ते चालुक्यशैलीत बांधले असले, तरी त्यांत नागरशैलीत आढळणारे स्तंभशीर्षांचे ज्ञापक सर्वत्र आढळते आणि सांप्रत त्याचे गर्भगृह व काही स्तंभच अवशिष्ट आहेत. स्तंभांवर तुळ्या आहेत. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस स्तंभ आहेत. स्तंभशीर्षावर सिंहाकृती असून मधल्या कंगोऱ्यात अनेक मूर्ती कोरल्या आहेत. त्यात कामशिल्पे आढळतात. भिंतीच्या तळाशीही शिल्पांकन आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर गजलक्ष्मी, शेषशायी विष्णू व सप्तमातृका यांच्या प्रतिमा आहेत. वितानात (छत) अष्टदिक्‌पालांच्या मूर्ती असून द्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांच्या मूर्ती आढळतात, तसेच समोरच्या भिंतीतील स्तंभांवर ब्रह्मा व विष्णू यांच्या सुरेख मूर्ती आहेत. प्राकारातील स्तंभ चौकोनी, षट्‌कोनी व अष्टकोनी असून त्यांवर विष्णूचे अवतार आणि नृत्यांगनांच्या सुंदर मूर्ती आहेत. त्याच्या वास्तुशैलीवरुन तज्ञांच्या मते ते अकराव्या शतकातील असावे.

सिन्नरचे वैभव महागणपती

सिन्नर तालुक्याचे वैभव असलेला महागणपती हा ऐतिहासिक धार्मिक वास्तूपैकी एक मानला जातो. महाराष्ट्रातील दोन नंबरची उंच असलेली व सिमेंट काँक्रिट असलेली भव्य मूर्ती राज्यासह देश विदेशात प्रसिद्ध आहे. हा गणपतीची मूर्ती सिन्नरचे वास्तूशिल्पकार रंगनाथ गंगाराम लोखंडे यांनी स्वखर्चातून १९४७ साली साकारली.
   सिन्नरला ऐतिहासिक, धार्मिक स्तळे असल्यामुळे शहराला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. येथील गोंदेश्वर मंदिर हे हेमाडपंथी मंदिरापैकी एक असलेले मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर सिन्नरचा भव्य गणपतीही तितकाच प्रसिद्ध आहे. लाल रंगाने अच्छादलेला भव्य गणेशाला सिन्नरच्या वैभवात महत्वाचे स्थान आहे. सिन्नरचे पेंटर म्हणून प्रसिद्ध असलेले रंगनाथ लोखंडे यांनी ही मूर्ती सिमेंट काँक्रिटमध्ये तयार केली. यासाठी वाळू, दगड, विटा, स्टीलचा वापर करण्यात आला आहे. ही मूर्ती त्यांनी स्वखर्चातून तयार केली. त्यावेळी ही मूर्ती बनवण्यासाठी १३५० रुपये खर्च आला होता. सर्वप्रथम सिमेंटच्या चौकोनी चौथऱ्यावर ही मूर्ती तयार केली. ही मूर्ती अनेक वर्ष उघड्यावर होती. या मूर्तीला ६५ वर्षे होऊनही वातावरणाचा कुठलाही परिणाम झालेला नाही. काही वर्षांपूर्वी या महागणेशावर
आरसीसी शेडचे आच्छादन करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक वातावरणापासून या मूर्तीचे संरक्षण झाले.
या महागणेशाची उंची १७ फूट असून, राज्यात दोन नंबरची भव्य मूर्ती असल्याने सर्वप्रथम एअर इंडियाने हा गणपती आपल्या दिनदर्शिकेवर प्रसिद्ध केला. त्यामुळे या गणपतीला राज्य व देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीमुळे देश विदेशातील पर्यटक सिन्नरला महागणपतीच्या दर्शनासाठी येतात. दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला या गणेशाभोवती फुलांची सजावट करून विद्युत रोषणाई केली जाते. गणेशोत्सवात या ठिकाणी आकर्षक रोषणाई केली जाते.
    या महागणपतीच्या परिसरात सिन्नरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे मंदिर असून, बाजूला शनेश्वराचे मंदिर दक्षिणमुखी मारुती व शंकराचे मंदिर आहे काही वर्षापूर्वी सिन्नरकरांनी या मंदिराचे जीर्णोद्धार केल्यामुळे हा परिसर शहराचा ऐतिहासिक, धार्मिक स्थळाची साक्ष देत आहे. सिन्नरच्या वैभवात मानाचा तुरा या मंदिरांनी उभा केला आहे.

गारगोटी संग्रहालय (माळेगाव – सिन्नर)

महाराष्ट्र देशीचे हे राकट -कणखर दगड आतून अस्सल हिरे आहेत हे प्रत्यक्ष पाहायचे असेल तर नाशिक – शिर्डी मार्गावरील सिन्नर MIDC मधील, अशा अत्यंत बहुमोल किंबहुना ज्यांचे मोलच होऊ शकणार नाही अशा दगडांचे अप्रतिम “गारगोटी संग्रहालय ” पाहायला हवे.आशिया खंडातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे गारगोटी संग्रहालय  माळेगावच्या औद्योगिक वसाहतीत. श्री. कृष्णचंद्र पांडे या रत्नपारख्याने हे जागतिक दर्जाचे संग्रहालय दोन काटी रुपये खर्च करून त्यानी उभारले आहे. गारगोटयांचा विविध आकारातील, रंगातील संग्रह थक्क करणारा आहे.

श्री. पांडे ह्यांच्या कित्येक वर्षाच्या परिश्रमामुळे संग्रहालयात आपल्याला निसर्गाची ही किमया पहायला मिळते.ह्या संग्रहालयात प्रवेश केल्यावर भारतमातेची भव्य व तेजस्वी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते.
 त्याचबरोबर इथे लाइट ग्रीन दगड, पिवळ्या कॅल्साइटचे स्फटिक यांचे प्रदर्शन मांडले आहे.पुणे,जळगाव,औरंगाबाद ते थेट मुंबईतील मालाड येथे सापडलेले हे दगड फोडल्यावर आत सापडणारे स्फटिकापासून हिऱ्यांपर्यंत मौल्यवान जडजवाहिर यात पाहायला मिळते. येथे अशा प्रकारच्या दगडांचा जगातील सर्वात मोठा संग्रह आहे. ३५ कोटी वर्षांपूर्वींचा, दागिन्यात वापरायला सुंदर असा निळ्या झुपक्यांचा, काळोखात चमकणारा, भारताच्या नकाशाच्या आकाराचा असे अनेक दगड ( यांना दगड म्हणतांनाही मन कचरते ) येथे आहेत.




05 L-300

06 L-300
पैलू न पाडलेला हिरा,गुजरातमधील डायनासोरचे जीवाश्म ( Fossils), ज्वालामुखीतून उडणारे Volcanic Bombs,कापसासारखे हलके दगड, खाणीत थेट सापडलेला शुद्ध सोन्याचा मोठा तुकडा, चंद्रावरून आणलेला आणि मंगळावरून आणलेला दगड अशा अनेक दुर्मिळ गोष्टी येथे पाहायला मिळतात. गाईड आपल्याला सर्व माहिती देतोच आणि विशेष म्हणजे येथे “फोटोग्राफीस अजिबात मनाई नाही “. झीओलाइट या प्रकारच्या असंख्य स्फटिकांचे इथे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येक झीओलाइटला स्वतंत्र रंग आणि आकार असतो हे इथे पाहिल्यावर प्रकर्षांने जाणवते. हे स्फटिक हिऱ्यांसारखे अथवा कोणत्याही मौल्यवान खडय़ांसारखे दिसतात. यांचा वापर खरं तर जलशुद्धीकरण आणि जड पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. या ठिकाणी विविध खनिजे, स्फटिक आणि पाषाण निरनिराळ्या आकारांत आणि रंगांत पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे लाइट ग्रीन दगड, पिवळ्या कॅल्साइटचे स्फटिक यांचे प्रदर्शन मांडले आहे. या संग्रहालयाला सरस्वती पुरस्कार, सिन्नर गौरव पुरस्कार आदींनी गौरवण्यात आले आहे. 

P1000373.JPG

P1000515_0.JPG
हे संग्रहालय वर्षभर सकाळी १० ते रात्री १० उघडे असते. याचे प्रवेशमूल्य माणशी रु. १०० एवढे आहे. काही वेळा हे प्रदर्शन प्रेक्षकांकरिता २४ तास खुले असते.
सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयाला ज्यांनी भेट दिली असेल त्यांचे डोळे तेथील भूरत्नांची दुनिया पाहून विस्फारले असतील. अशीच स्थिती नगर येथील बहिरनाथ वाकळे यांच्या घरी गेल्यावर आपली होते. वरून ओबडधोबड दगड, पण आतमध्ये स्फटिकाचे फूल फुललेले...काहींचा आकार तीक्ष्ण सुयांसारखा, काही खोब-यासारखे, तर काही पांढ-या शुभ्र कापसासारखे. काहींचा रंग निळाभोर, तर काहींना गुलाबी-जांभळी छटा. काहींमधून पाझरणारा हिरवा रंग, तर काहींमध्ये एकाच दगडात तीन-चार रंग सामावलेले. कॅलसाइट, कॅवनसाइट, स्टीलबाइट, स्टीलराइट, अ‍ॅपॉफिलाइट, अ‍ॅमथिस्ट, मेसोलाइट अशा अनेक नावांनी या गारगोट्या ओळखल्या जातात. रांगोळीसाठी वापरले जाणारे सामान्य शिरगोळे आणि हि-यासारखी अमूल्य रत्ने यांचीच ही भावंडे. ज्वालामुखी शांत होताना खडकात काही पोकळ्या निर्माण होऊन तेथे विविध रसायने साचतात. त्यातून मिनरल्सचे वेगवेगळे प्रकार तयार होतात. जेवढी कठीणता आणि पारदर्शकता जास्त तेवढे त्याचे मूल्य अधिक. या छंदाची सुरुवात कशी झाली याविषयी वाकळे सांगतात - ‘पूर्वी आम्ही सावेडी गावात राहत. त्या काळी शहराजवळून सीना नदी वाहत असे. नदीतील वाळूत आम्ही खेळायचो. वाळूत रंगीत खडे सापडायचे. ते गोळा करून मी बाटल्यांमध्ये साठवत असे.’ हा छंद त्यांनी मोठेपणीही जोपासला. इंटरनेटवरून मिनरल्सची माहिती मिळवायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचे प्रकार, वैशिष्ट्ये, वेगळेपण, किमती अशा अनेक गोष्टी जशा कळायला लागल्या. त्याबरोबर गारगोट्यांचे महत्त्व लक्षात यायला लागले. नगर जिल्ह्यात राहुरी, पारनेर, सावळीविहीर या भागांत हे दगड सापडतात. एखाद्या विहिरीत किंवा खाणीत गारांचा थर सापडल्याचे समजले की, वाकळे तिथे जातात. रत्नपारखी जशी रत्नांची परीक्षा करतो तशी परीक्षा ते खडकांची करतात. मग तो खडक नीट कापून त्यातला निसर्गदत्त ठेवा ते उकलतात. वाकळे यांच्या घरातील शोकेसमध्ये गारगोट्यांचे 30-35 प्रकार पाहायला मिळतात. काही गारगोट्या त्यांनी अहमदनगर महाविद्यालयाला दिल्या आहेत.
15 L-300
गारगोट्यांच्या जोडीने वाकळे यांच्या घरात विविध विषयांवरील ग्रंथही नांदताना दिसतात. अनेक अँटिक वस्तूही त्यांनी जमवल्या आहेत. शंभर वर्षांपूर्वीच्या बग्गीचा टॉर्च, घरगुती सिनेमा पाहण्यासाठी वापरला जाणारा फिल्म प्रोजेक्टर अशा काही खास चिजा त्यांच्याकडे आहेत. या सगळ्याचे संग्रहालय लवकरच उभे राहिलेले दिसेल.

देवपूरचा राणेखान वाडा

देवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे. त्या परंपरेतील संत बाबा भागवत महाराज यांचा जन्म देवपूर गावी झालेला आहे. भागवत बाबांच्या जन्माचा भाग अनेक चरित्रकारांनी रसाळ पद्धतीने रंगवलेला आहे. देवपूर गावाची महती तीन नावांनी प्रसिद्ध आहे. गावाला राजकीय दृष्टिकोनातून नाना गडाखांचे देवपूर असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने, ‘बाबा भागवतांचे देवपूर’ असा उल्लेख केला जातो. तर ऐतिहासिक दृष्टीने ‘ते गाव ‘राणेखानचे देवपूर’ म्हणून ओळखले जाते. राणेखानचे वंशज देवपूर येथे राहत नाहीत. मात्र राणेखानबद्दलची संक्षिप्त माहिती गावातील कबरीच्या दर्शनी भिंतीवर कोरलेली आहे.
    देवपूर गाव देवनदी तीरावर वसले आहे. गावाच्या चौफेर हिरवीगार झाडी आहे. त्या वनराईच्या आश्रयाने अनेक त-हेचे पशू–पक्षी वास्तव्य करून आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचा पक्षी म्हणजे मोर. ब्रिटिशांनी देव नदीवर कालवा बांधला. नदीतील पूरपाणी गावानजीकच्या शेतीला त्या कालव्यातून पुरवले जाते. त्यामुळे गावाचा बराचसा भाग हा ओलिताखाली आला. गावामध्ये विविध जाती-धर्मांचे लोक आहेत. मराठा, जरेमाळी, मांग, महार, ढोर, परिट, भिल्ल, चांभार, सोनार, मारवाडी, कोळी, ब्राह्मण इत्यादी जातींचे लोक एकत्र राहतात. सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या विडी उद्योगाचे काही कारखाने देवपूर गावामध्ये पूर्वी चालत. परंतु विड्यांची मागणी कमी होत असल्याने तो उद्योगधंदा मंदीच्या मार्गावर आहे.
    देवपूरात वर्षभरातून दोन वेळा यात्रोत्सव पार पडतो. यात्रा म्हणजे गावकऱ्यांसाठी जणू ती पर्वणी असते! चैत्र शुद्ध पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी संत बाबा भागवत महाराज पालखीची ग्रामप्रदक्षिणा सुरू होते. त्या दिंडी सोहळ्यासाठी देवपूर, धारगाव, फर्दापूर, पंचाळे, शिंदेवाडी या पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. टाळ, मृदंग, वीणा या वाद्यांच्या तालात दिंडी प्रदक्षिणा सुरू असते. पालखी पहाटे पाच वाजता ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून मंदिराच्या गाभाऱ्यात येते. कावडीची मिरवणूक दुसऱ्या दिवशी होते. त्यासाठी भाविक ग्रामस्थ गोदावरीचे पाणी पायी जाऊन घेऊन येतात व गावातील देवतांना त्या जलाने स्नान घालतात. त्याच दिवशी कुस्त्या होतात. सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. काल्याच्या कीर्तनाने यात्रेचा शेवट तिसऱ्या दिवशी होतो.
   श्रावण महिन्यामध्ये सव्वा महिना महादेवाच्या मंदिरात अखंड नंदादीप तेवत ठेवतात. गावातील प्रत्येक कुटुंबातून नंदादीप लावला जातो. ते दीप लावण्याचे काम गावातील गुरव समाजाचे लोक करतात. त्या बदल्यात त्यांना दक्षिणा दिली जाते. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्रावण पंचमीच्या दिवसापासून गावामध्ये केले जाते. गावातील वाड्यानुसार पहारा (वीणा किंवा टाळ यांचा नाद अखंड सुरू ठेवणे) दिला जातो. सात दिवस सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ होतो. रात्री नऊ वाजता कीर्तन, पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होते. श्रावण वद्य एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाचा समारोप होतो.
गावातील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सव मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीच्या दिवशी भरतो. त्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे खंडेराव महाराजांचा भगत बारा बैलगाड्या ओढत आणतो. जागरण, गोंधळ यांसारखे महत्त्वाचे कार्यक्रम (विधी) उत्सवात पार पाडले जातात. त्र्यंबकेश्वर येथे होणा-या निवृत्ती महाराज यात्रेसाठी श्री क्षेत्र बेलापूर येथून सुमारे चारशे वर्षांपासून पायी दिंडी सोहळा पौष महिन्यामध्ये आयोजित केला जातो. त्यासाठी लागणारी शिधासामग्री, बैलांसाठी चारा ही व्यवस्था गावकरी करतात. श्री क्षेत्र देवपूर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा असतो. शेकडो भाविक त्या सोहळ्यात सहभागी होतात.  पंचक्रोशीतील लोक बाबा भागवत महाराजांच्या दर्शनासाठी प्रत्येक एकादशीला येतात. संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होतो. गावामध्ये नवरात्रोत्सव, गणेशोत्सव हे देखील मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
   देवपूरला पौराणिक ऐतिहासिक महत्त्वही आहे. पानिपतची तिसरी लढाई मराठे व अहमदशहा अब्दाली यांच्यात जानेवारी १७६१ मध्ये झाली. लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे सेनापती महादजी शिंदे जबर जखमी झाले. त्यांना राणेखान याने पाणक्याचा वेश धारण करून सुरक्षित ठिकाणी हलवले व त्यांच्यावर उपचार करून त्यांचा जीव वाचवला. महादजी शिंदे यांनी राणेखानच्या धाडसाचे कौतुक पेशवे दरबारात केले. त्या उपकारांची परतफेड म्हणून त्याला पैसा, जडजवाहिर, हत्ती, घोडे व निमगाव, देवपूर आणि जामगाव पास्ते या गावांची जहागिरी दिली. राणेखानने देवपूर गावात अनेक वाडे व हवेल्या बांधल्या. तसेच, त्याने संत श्री बाबा भागवत महाराजांच्या संस्थानाजवळ एक मशीद व मंदिर बांधून, हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. राणेखानने बंधारे बांधून देवपूर परिसर समृद्ध केल्याचे दाखले आहेत. राणेखानचे निधन २२ डिसेंबर  १७९१ रोजी झाले.
    राणेखानने देवपूर गावातून वाहणा-या देवनदीच्या पश्चिम किनाऱ्यालगत निसर्गरम्य जागेत ‘बडाबाग’ हे शाही कब्रस्तान बांधले होते. कबरीचे आवार सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील देवपूर फाटयापासून साधारण तीनशे मीटर अंतरावर सुरू होते. त्या आवाराच्या पश्चिमेकडील पुरुषभर उंच तटबंदी, घडीव दगडातील दरवाज्याची कमान व अन्य अवशेष यांमधून जाणवणाऱ्या गूढ वातावरणाच्या सान्निध्यात, राणेखानच्या समाधिस्थळाचा ‘सौंदर्यानुभव अधिक आकर्षक वाटतो. राणेखानच्या समाधीजवळ आणखी दोन समाधी आहेत. त्यांपैकी एक त्याच्या आई-वडिलांसाठी व दुसरी एका नर्तकीसाठी बांधण्यात आली होती. त्या आवारात समाधीसारख्या दिसणाऱ्या इतर वास्तू व चबुतरे यांचे अवशेष आहेत. आवारातील सर्व जागा दगडी पायवाटेने एकमेकांस जोडल्या गेलेल्या आहेत. काटकोनातील मोकळ्या जागेत कारंज्यांनी सजवलेले हौद व निरनिराळी झाडे यांमुळे ती जागा त्या काळी अधिक शोभिवंत दिसत असावी. परिसरात पेरु, चिंच व डाळिंब यांच्या बागा असल्याने शेकडो मोर वास्तव्यास आहेत. राणेखानने त्याचे मरणोत्तर जीवन प्रसन्न, शांत व सर्वांगसुंदर स्थळी जावे म्हणून त्या जागेचा आराखडा व त्यातील वास्तू, स्थापत्यकलानिपुण, कला-संवेदनशील कलाकाराकडून बनवून घेतल्या असाव्यात याचा प्रत्यय ते स्थळ पाहताना पावलोपावली येतो.
साधारणत: पराक्रमी वीर पुरुषांची समाधिस्थळे कणखर व राकटपणाचे दर्शन घडवतात, पण राणेखानची समाधी त्या बाबतीत वेगळी ठरते. त्याने स्वत:साठी बांधलेले समाधिस्थळ, आकाराने भव्य नसले तरी ते कला-सौंदर्यपूर्ण स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या समाधीसाठी वापरलेला फिकट पिवळसर भुरकट रंगातील दगड हा पोरबंदर – गुजरात -येथील, लाईमस्टोन व सँडस्टोन यांच्याशी मिळताजुळता दिसतो. जमिनीपासून सहा फूट उंच चौथऱ्याचा भाग, समाधीची जोत्यापर्यंतची रचना, त्यावरील कोरीव व लयबद्ध आकृतिबंध पाहणाऱ्याला गुंतवून ठेवतात. चौथऱ्यावरील समाधीभोवतीची मोकळी जागा समाधिस्थळाच्या भव्यतेत भर घालते. समाधीच्या चारही दिशांना भिंतीच्या सम आकारातील पोकळीत दरवाजे बसवले आहेत. त्यावर कोरलेली अनेक पदरी महिरप, दरवाज्याची दुपदरी दगडी चौकट, अर्धगोलाकार कमान व आयताकृती चौकटीतील भिंतीचा पृष्ठभाग तासून साधलेले कोनाडे आणि भिंतीपासून पुढे ओढलेल्या तळभागातील दगडी पटट्यांवरील ठळक कोरीव नक्षीकाम प्रेक्षकाला भान विसरायला लावते. चारही कोनाडयांतील भिंतींचे पृष्ठभाग, भिंत व छताचे सांधे जेथे मिळतात त्या कोपऱ्यांत फिटट् बसवलेले दगडी पुष्पकळ्यांचे आकृतिबंध व दगडात कोरलेला फुलांच्या देठाएवढा फुगवट्याचा भाग स्थापत्यकलेतील लवचीकतेचे उदाहरण आहे. बहु अर्धगोलाकारातील आयताकृती दगडी चौकटीत बसवलेल्या कमानीला धरून ठेवणारे दोन्ही बाजूंचे स्तंभ ही मुघल वास्तुकलेची शैली समजली जाते. चारही दिशांच्या दर्शनी भिंतींवरील कमानी व त्यात कोरलेले नाजूक आकृतिबंध आणि कोपऱ्यातील खाचेत बसवलेल्या रेखीव स्तंभाची रचना कलासक्त नजरेतून निर्मिलेला आविष्कारच वाटतो! समाधीच्या घुमटाचा कळीदार पाकळ्यांतून बनवलेला बाह्यभाग व छताचे चारी कोपरे आणि दरवाज्याच्या माथ्यावरील कमी-अधिक उंचीचे मनोरे त्या समाधिस्थळाचे सौंदर्य समृद्ध करतात. समाधिस्थळाच्या जोत्याच्या चारी बाजूंच्या पृष्ठभागावरील व छताच्या उतरत्या सज्ज्यावरील आकृतिबंधातील नक्षीकाम व इतर घटक पाहणाऱ्याची नजर खिळवून ठेवतात. सुंदर निळे आकाश, काटेरी बाभूळ व कडुनिंबाच्या सावलीत कलासंवेदनशील कलावंताने घडवलेले ते दगडी शिल्प, दिमाखाने उभे आहे.
समाधीची अंतर्गत रचना कलात्मक व मन प्रसन्न करणारी आहे. चारही दिशांतील दरवाज्यांचा काटकोन साधून समाधीच्या मधोमध ठेवलेला पांढऱ्या रंगातील चबुतरा लक्षवेधक आहे. भिंतीच्या अंतर्भागावर पांढऱ्याशुभ्र चुन्याच्या गिलाव्यात केलेल्या कोनाड्यांचे लहान-मोठे छाप व आकृतिबंध यांतून साधलेली लयबद्धता या गोष्टी त्या जागेची मर्यादा विस्तारण्याचे काम करतात. समाधिस्थळाच्या सम दरवाज्याची रचना व पांढरा रंग यांमुळे परावर्तित सूर्यप्रकाश त्या वास्तूत सूर्यास्तापर्यंत राहतो. पश्चिमेकडील दरवाज्याच्या चौकटींची फिकट हिरवी रंगछटा त्या जागेत चैतन्य फुलवण्याचे काम करते. घुमटाच्या आतील व चौकटीच्या भागावरील कोरीव कामात विविधता दिसते. समाधीच्या अंतर्बाह्य पृष्ठभागावरील लहानमोठया आकारातील सम आकृतिबंधांच्या पुनरावृतीत त्या स्थळाचे खरे ‘सौंदर्य दडलेले आहे. त्या अभिजात वास्तुकलेत परिसरातील रुक्षपणा विसरवण्याची क्षमता आहे.
    राणेखानने स्वत:च्या वास्तव्यासाठी देवपूरची निवड केली होती. त्याने तेथे बांधलेली चार मजली हवेली अवशेषरूपात उरली आहे. त्या वाडयात, दहाएक वर्षांपूर्वी विड्या वळण्याचे काम होत असे व काही वर्षांपूर्वी त्या जागेचा उपयोग गोदामासाठी केल्याचे कानावर आले. देवपूर गावाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या वेशीचे चिरे ढासळले आहेत, तर वेशीचे जीर्ण दरवाजे लेचापेच्या आधारावर उभे आहेत.राणेखानचे समाधिस्थळ, ज्या काळात बांधले होते ते जसेच्या तसेच आहे! काही घडीव चिरे ढासळले आहेत, पण त्यांचे प्रमाण कमी आहे.

नाशिकच्‍या वडांगळी गावची अजब प्रथा

 

नाशिकच्‍या सिन्‍नर तालुक्‍यातील वडांगळी गावात धुलीवंदन ते रंगपंचमी अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून धिंड काढण्‍याची अजब परंपरा पाळली जाते. त्‍यामुळे ज्या गावात लग्नावेळी मोठ्या सन्मानाने वाजत गाजत घोड्यावरून मिरवले गेले तेथेच गाढवावरून धिंड काढली जाण्याची वेळ वडांगळीच्या जावयांवर येते.

वडांगळी गावची ती जगावेगळी प्रथा नेमकी कधी सुरू झाली ते निश्चित सांगता येत नाही. मात्र तिला शंभर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असल्‍याचे गावकरी सांगतात. इंग्रज आमदानीत एका इंग्रज मामलेदाराची वडांगळीच्‍या गावक-यांनी गोड बोलून गाढवावरून धिंड काढल्याची आठवण गावचे पूर्वज सांगत असत. प्रसिद्ध तमासगीर तुकाराम खेडकर यांचा तमाशा वडांगळी मुक्कामी असताना त्यांचीही या प्रथेमध्ये गाढवावरच्या धिंडीसाठी वर्णी लागली होती. गेल्‍या शंभर वर्षांच्या काळात कधी कधी ती प्रथा खंडीतही झाली, मात्र त्या त्या काळातील तरुणाईने तितक्याच उत्साहाने ती पुन्हा सुरूही केली.

धुलीवंदन ते रंगपंचमी या पाच दिवसांत गावातील घरजावई, गावजावई अथवा गावकरी ज्यांना जावयाच्या नात्याने वागवतात अशा व्यक्तींचा धिंडीसाठी प्राधान्याने विचार केला जातो. नोकरीधंद्यानिमित्त गावात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या व्यापारी, नोकरदार व्यक्तींशी गावक-यांकडून जावयाचे नाते लावले जाते. त्यांच्या बायकांना मुलीचा दर्जा दिला जातो. त्‍यांच्‍याशी गावातील तरुण मंडळींचे मेहुण्यांचे चेष्टेचे नाते निर्माण होते. दाजी दाजी म्हणत बहिणीच्या नव-याचा वर्षभर मान राखायचा, मात्र शिमग्याला वर्षभराचे उट्टे काढत त्याची गाढवावरून धिंड काढायची अशी ही मजेशीर प्रथा आहे.

जावयाला धिंडीसाठी राजी करणे हे दिव्यच असते. कोणी जावई राजीखुशीने स्वत:ची धिंड काढून घ्यायला तयार नसतोच. मग गावातील तरूण मंडळीकडून जावयांवर साम, दाम, दंड, भेद, इमोशनल ब्लॅकमेलिंग अशी सर्व आयुधे वापरली जातात. त्‍यसाठी गुप्त मसलती, खलबते केली जातात. अनेक जावई होळी-रंगपंचमीच्‍या काळात गावाबाहेर निघून जातात. पण कोणी ना कोणी खिलाडूवृत्तीचा जावई सापडतोच! ज्याला गावात मान आहे, प्रतिष्ठा आहे अशा सुस्वभावी, मनमिळावू व्यक्तीला प्रथेसाठी प्राधान्य दिले जाते. ग्रामस्थांच्या दृष्टीनेही असा जावई म्हणजे टप्प्यातील सावज असते. किरकोळ आढेवेढे घेत, प्रसंगी “रेमंडचे कपडे घ्याल तर बसतो गाढवावर.” अशी मागणी करत तयार होणारे जावईही भेटतात. जावयाची मनधरणी करणा-या व्‍यक्‍तीकडेच बहुतेक वेळा प्रथेचे यजमानपद येते. मग धिंडीसाठी लागणारा खर्च, त्यानंतर जावयाला करायचा पंचवस्त्रांचा पोशाख याचा खर्च यजमानाला करावा लागतो आणि मग सुरू होते धिंड!

शिमग्याच्या दिवशी वडांगळी गावात वीरांची मिरवणूक पार पडते. गावात घरोघरी वीरांची तळी भरली गेली, की धुळवड सुरू होते. होळीतील राख पाण्यात कालवून धूळमातीची धूळवड खेळली जाते. पण वडांगळीकरांच्या धुळवडीला खरा रंग चढतो तो जावयाच्या गाढवावरील धिंडीने!

मनधरणी, मिनतवा-या करून तयार झालेला जावई गाढवावर बसवला जातो. त्याच्या अंगावरील कपडे फाडले जातात. गळ्यात कांद्यांचा, फाटक्या खेटरांचा हार घातला जातो. काही फाटक्या टायरचेही हार असतात. डोक्‍याला लसणाच्या मुंडावळ्या आणि फाटक्या सुपाचे बाशिंग बांधले जाते. मग यजमानाच्‍या घरापासून ती जगावेगळी मिरवणूक सुरू होते. होळीतील राख, रंग, गाळ, चिखल, माती यांची मनसोक्त उधळण करत गावातील एकेका गल्लीतून जावई गाढवावरून मिरवला जातो. जावई हा सासरेबुवांच्‍या कुंडलीतील ‘दशमग्रह’ समजला जातो. म्‍हणूनच जावयाची धिंड म्हटल्यावर मिरवणूकीत चांगलाच जोष संचारतो. बोंबला रे बोंबला बों ऽ बों ऽ बों ऽ ऽ म्हणत जावयाचे विविधांगांनी गुणवर्णन करत बोंबा मारल्या जातात. अनेक घरांपुढे खास धिंड थांबवून कांद्यांच्या, चपलांच्या माळा जावईबुवांच्या गळ्यात अडकवल्या जातात.

प्रथेचा उल्‍लेख ‘गाढवावरून धिंड’ असा केला जात असला तरी धिंडीसाठी गाढवीण वापरली जाते. त्‍या गाढविणीला धिंडीत नवरी संबोधले जाते. (लग्न लावले जात नाही हे नशीब!) करवले म्हणून गावातील सर्व तरुण मेहुणे हजर असतात. सोबतीला शिमग्याच्या बोंबांची मंगलाष्टकेही असतातच. असा जोरदार शिमगा करून यजमानाच्या दाराशी धिंड संपते.

त्‍यानंतर गल्लीतील चार घरच्या सुवासिनी एकत्र येऊन जावयाला सुगंधी उटणे लावून अंघोळ घालतात. त्यानंतर यजमानाकडून जावयाला पंचवस्त्रे देण्‍यात येतात. गावच्‍या प्रथेचा मान राखल्याबद्दल यजमान व ग्रामस्थ जावयाचे आभार मानतात. त्यानंतर जावई नवीन वस्त्रे परीधान करून ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्वीकारत गावातील प्रमुख रस्त्यावरून फेरी मारतो. त्यानंतर धिंडीचा कार्यक्रम संपतो.

 

जावयाची गाढवावरून धिंड निघाली, की गावावरचे दुष्काळाचे सावट दूर होते. पाणीपाऊस चांगला होतो. रोगराई टळते, गावाची भरभराट होते अशी गावक-यांची धारणा आहे. त्‍यामुळे जावयाला गावाच्या भल्यासाठी जावयाला गाढवावर बसण्याची गळ घातली जाते.

या प्रथेमुळे जावयाच्‍या ठायी असलेला ताठा, अहंकार गळून पडतो असे मानले जाते. तसेच, जावई वर्गासाठी ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत बनण्याची ती मोठी संधीच! या प्रथेच्‍या नि‍मित्‍ताने वडांगळी गावच्‍या जावयांना त्‍यांच्‍या खिलाडूवृत्तीचे जगाला दर्शन घडवता येते.

लग्नाची मिरवणूक अन् धिंड यांची तुलना होतेच! दोन्हीत मात्र कमालीचा विरोधाभास! लग्नात घोडा असतो. या मिरवणुकीत गाढवाला मान, लग्नात जावयाला नवे कपडे, नवे बुट तर येथे असलेले कपडे फाडून लक्तरे मिरवत मिरवणूक काढली जाते. लग्नात कोरे बुट असतात तर या धिंडीत गळ्यात फाटक्या खेटरांचा हार असतो. मोत्यांच्या मुंडावळ्यांऐवजी लसणाच्या मुंडावळ्या अन् फुलांच्या हारांऐवजी कांद्याचे हार, अंगाला हळद लावण्याऐवजी चिखलमातीचा लेप लावला जातो. लग्नात शुभेच्छा दिल्या जातात तर येथे मात्र बोंबला रे म्हणत बों ऽ बों ऽ बों ऽ ऽ म्हणत तोंडावर आडवा हात मारत शिमगा केला जातो. चिखलमातीच्या रंगांच्या अक्षता उधळीत धिंडीत चांगलेच उट्टे काढले जाते.

धुळवड ते रंगपंचमी या पाच दिवसांत कधीही ती धिंड निघते. पाडव्याला जर जावई सापडला नाही तर किमान रंगपंचमीपर्यंत त्याची शोधमोहीम सुरू राहते. कधी कधी हा ‘जावईशोध’ रंगपंचमीला संपतो. अखेरच्या दिवसापर्यंत जावईशोध घेतल्यानंतर तो रंगपंचमीच्‍या दिवशी मिळाला तर प्रथेतील रंगत आणखी वाढते. जोपर्यंत जावई भेटत नाही तोपर्यंत, यंदा प्रथेत खंड पडतो की काय अशी धाकधूक सगळ्यांनाच असते.

आता आतापर्यंत वडांगळीतील हरहुन्नरी नाट्यकलावंत शिवाजी गोरे यांचा त्‍या प्रथेच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण सहभाग असे. त्यांचा स्वत:चा कुंभाराचा व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे स्वत:ची गाढवे होती. जावयाच्या धिंडीसाठी पोटाचा मोठा घेर असलेली ‘हरणी’ नावाची गाढवीण ते वापरत असत. ती गाढवीण चांगल्या भरभक्कम वजनाच्या जावयाचा बोजाही सहज पेलू शकत असे. धुळवडीतील गोंगाट, चिखलफेक व वाजंत्री यांचा तिच्यावर परिणाम होत नसे. त्यामुळे धिंड जोरात व्हायची. आता ‘हरणी’ गाढवीण नाही. तिचा मालक शिवाजी गोरेही नाही. त्यामुळे त्या प्रथेच्या मार्गात अनेक अडचणी उभी राहिली आहेत. बदलत्या काळात गावात गाढव मिळणे दुरापास्त झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून बाहेरगावाहून गाढव भाड्याने आणून हौशी ग्रामस्थ धिंडीची प्रथा पार पाडत आहेत. सिन्नर, सायरवेडा अशा ठिकाणाहून गाढव स्पेशल गाडी करून भाड्याने आणण्याची कसरत करावी लागते. त्यामुळे यजमानाला ‘जावयाच्या मानपानाचा खर्च परवडला पण गाढवाचा नको’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

असे असले तरी वडांगळी गावात धुळवडीच्या दिवशी न चुकता रंगांच्या अक्षता उधळत जावयाचे गाढवावरुन धिंडवडे निघतात. पण ते सारे परंपरेच्या आनंदासाठीच!

हिरेखानाचे सोनांबे

इतिहास नोंदविला गेला नाही अथवा त्याच्या नोंदी पुढे आल्या नाहीत तर काय होते. हे अनुभवायचे असेल तर नाशिकमधील अनेक गावे याची उत्तम उदाहरणं म्हणायला हवीत. पिढ्यांपिढ्या ऐकत आलेल्या गोष्टींवर अनेक गावांचा इतिहास तग धरून उभा आहे. अशीच काहीशी परिस्थिती सिन्नर तालुक्यातील सोनांबे या गावाचीही आहे.
नाशिकच्या नसानसात ऐतिहासिक ऐश्वर्य अन्‌ शौर्य दडलेलं आहे. त्याच्या पाऊलखुणा गावागावांमध्ये आजही अनुभवयाला मिळतात. मात्र या पराक्रमी आणि इतिहास घडविणाऱ्या रणधुरंधरांचा इतिहास अजूनही अज्ञातवासात खितपत पडलेला दिसतो. त्यांच्या शौर्याला त्यांनी उभारलेल्या ऐश्वर्यसंपन्न इतिहासाला पुनर्वैभव मिळवून देण्याची अज्ञातवासात असलेला इतिहासाला झळाळी देण्याची गरज आहे. सातवाहन ते यादव कालखंड, मुस्लिम राजसत्ता, त्यानंतर आलेला शिवकाळ अन् पेशवाईच्या काळात नाशिकमध्ये मोठे बदल झाले.

पेशव्यांच्या अनेक सरदारांना नाशिक परिसरातील गावांच्या जहागिऱ्या मिळाल्यामुळे त्यांचे वास्तव या परिसरात कोणत्या ना कोणत्या निमित्ताने झालेले दिसते. मोरोपंत पिंगळे असोत वा मस्तानी असो की पेशव्यांचा समशेर यांचे नाशिकशी ऋणानुबंध कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जुळले आहेत. त्यांच्या पाऊलखुणा आजही त्यांचे अस्तित्व गावागावांमध्ये दाखवितात. त्याप्रमाणे महादजी शिंदे, मल्हारराव बर्वे, अहिल्याबाई होळकर, राजेबहाद्दर नारोशंकर यांनसह अनेक सरदार, घराणी व संस्थानांचा ठसा परिसरातील गावांवर उमटलेला दिसतो. सिन्नरमधील देवपूर अन् राणेखानाच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. पानिपतच्या युद्धातून जखमी अवस्थेतेतील महादजी शिंदेंना राणेखानाने वाचविले व पुन्हा आपल्या मुलखात आणलं.

राणेखानाच्या निष्ठेवर खूश होत त्याला इमान म्हणून सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते ही गावे जहागिरी मिळाली. राणेखानाने देवनदीच्या किनारी प्रशस्त वाडा बांधला अन् येथेच विसावलाही. देवपूरमधील राणेखानाचा वाडा पाहताना त्यांच्या पराक्रमाची कल्पना येते. महादजी शिंदे राणेखानाला ‘भाई’ म्हणायचे अन् राणेखान गेल्यावर महादजी अनेक वेळा ‘भाई भाई’ म्हणून हाका मारायचे या संदर्भावरून राणेखानाचे व्यक्तित्त्व उलगडते. पण राणेखानाला हिरेखान नावाचा भाऊ असेल व देवपूरला राणेखान स्थिरस्थावर होत असताना त्याने आपल्या भावाला याच देवनदीच्या किनारी सिन्नरमधील सोनांबे या गावात वसवले असेल. हा इतिहास मात्र मौखिक रूपानेच सोनांबेकरांकडून ऐकायला मिळतो अन् त्या गावातील हिरेखानाच्या वाड्यासारख्या महालाच्या भिंती या इतिहासाचा साक्षीदार असल्याचे पहायला मिळतात. हिरेखान राणेखानासारखाच उमदा लढवय्या असणार, असा भास वाड्याच्या भिंतीला हात लावल्यावर होतो. दोघेही याच देवनदीच्या किनारी इतिहासाप्रमाणेच विसावले हेही दोघांमधील एक साम्य सोनांबे पुढे आणते.

सिन्नरहून सिन्नर-घोटी मार्गावर सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला सोनांबे फाटा लागतो. फाट्यावरून दोन किलोमीटर रस्त्याने आत गेल्यावर झाडांच्या पुंजक्यामध्ये सोनांबे देवनदीच्या किनारी वसले आहे. गावात प्रवेश करताना लहान मोठी मंदिरे, समाधी दर्शन देतात. सकाळी सकाळी पारावर जमलेले ज्येष्ठ मंडळींचा पांढऱ्या शुभ्र पेहराव व कोन काढीत पुढे डोकावणाऱ्या त्यांच्या डोक्यावरील पांढऱ्या गांधी टोप्या इतिहासाबद्दल बोलू लागतात. सोनांबे म्हणजे काय? या माझ्या प्रश्नांनं सर्वच अस्वस्त होतात अन् एक आठवणींचा उसासा टाकत हरविलेल्या गोष्टींना उजाळा देताना जी निराशा, आपलेपणातून निर्माण झालेली उत्सुकता त्यांच्या डोळ्यात उभी राहते. ‘काय दिवस होते’ ही त्या वैशिष्ट्यांची आताची किंमत त्यांना आठवणींचे भावविश्व उलगडताना पाहून अंगावर काटा येतो अन् ते पिवळे धमक आंबे आजही चाखता आले असते तर काय मजा आली असती, असं उगाच वाटून जातं. आंब्याचा सिझनातही आता सोनांबेत आंबा मिळत नाही, ही ज्येष्ठांमधील रूखरूख सर्वकाही सांगते. सोनांबे म्हणजे सोन्यासारख्या पिवळा धमक आंबा पूर्वी गावात पिकायचा. चार माणसांच्या घेराइतकी मोठाली आंब्याची झाडे गावात होती अन् त्यांना येणारे आंबे सोन्यासारखे झाडावर दिसायचे म्हणून गावाला सोनांबे असे नाव पडले, असेही सोनांबेकर सांगतात.

सोनांबेच्या नावाप्रमाणेच सोनांबेचा इतिहासही आहे. मात्र तो आता हरविलेल्या अवस्थेत आहे. औरंगजेबाने नाशिक परिसरातील किल्ले घेण्यासाठी पाठविलेल्या एक सरदार सोनांबेतील भैरवनाथाचे मंदिर पाडण्यासाठी गावात आला होता. त्यावेळी त्या सुलतान नावाच्या सरदाराच्या भावाला सोनांबेत साप चावला. त्यावेळी ग्रामस्थांनी त्याला तीन दिवस भैरवनाथ मंदिरात बसवून ठेवले व त्याला झालेली विषबाधा दूर झाली. त्या सुलतानाने मंदिराला हात तर लावलाच नाही उलट मंदिराच्या जीर्णोद्धाराला मदत केली. तेव्हापासून गावातील भैरवनाथाच्या यात्रेत मंदिरासमोर मंडप टाकण्याचा मान गावातील मुस्लिम कुटुंबियांना आहे, असे हरिषचंद्र सातपुते, एकनाथ पवार, राजू आंबेकर व ज्ञानेश्वर बोडके सांगतात. भैरवनाथ मंदिरात साप चावलेल्या व्यक्तीला तीन दिवस बसवून ठेवल्यास विषबाधा होत नाही, अशी एक समजूतही ग्रामस्थांमध्ये आहे. गावात देवपूरच्या राणेखानाच्या भावाची म्हणजेच हिरेखानाची मोठी तीन मजली हवेली देवनदीच्या किनारी आहे.

हवेलीला काही वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत ती पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र आजही हवेलीच्या तीन दिशांच्या बलाढ्या भिंती तग धरून उभ्या आहेत. या तीन मजली हवेलीचा दरवाजा अन् आतील लाकडी कोरीव काम अप्रतिम होते, असे तेथेच राहत असलेले हिरेखानाची वंशज पीरमहम्मद गुलाब पठाण व शाकिद पठाण सांगतात. मात्र आगीत सर्वकाही गेलं. हवेलीतील भुयार थेट देवपूरच्या राणेखानाच्या वाड्यात जाते, असेही ते सांगतात. मात्र आता तेथे कोणाला जावू दिले जात नाही. बिबी नावाची हिरेखानाची बहिण सोनांबेशेजारच्याच वडगाव सिन्नर या गावात दिली होती. बहिणीचे लग्न करताना हिरेखानाने भेट म्हणून सालखडी नदी दिली होती. त्यामुळे वडगाव सिन्नरची मंडळी हक्काने सालखडी नदीचे पाणी पाटाने गावात नेतात, असेही ग्रामस्थ सांगतात. हिरेखानाबद्दल इतिहास फार काही सांगत नसला तरी हवेली वजा वाडा त्याची शैली खूप काही सांगून जाते.

सोनांबेतील वतनदारीतील हेरफेरीचा एक संदर्भही इतिहासाच्या पानांमधून उलगडताना दिसतो. १७९६ मधील कारवाईचा एक मोडी कागद उपलब्ध झाला आहे. यानुसार, सिन्नर परगण्यातील मौजे सोनांबे या गावच्या दादो रघुनाथ कुळकर्णी याने मौजे बेलगाव तऱ्हाळे येथील कुळकण्यांचे वतन नसत्या भानगडी करून त्याच्यापासून निम्मे कुळकर्णीपण लिहून घेतले व जबरदत्तीने बेळगांव तऱ्हेळेच्या कुळकर्ण्यांचे घर मोडून टाकत तेथे वाडा बांधला होता. या संबंधिची फिर्याद दौलतराव शिंदे यांच्याकडे गेली होती. या फिर्यादीची दखल घेऊन मल्हारराव भिकाजी गोसावी यास पत्र लिहून याबाबात दादो रघुनाथ कुळकर्णीचा बदअमल मोडून काढण्याची आज्ञा दौलतराव शिंदे यांनी केली. त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, सोनांबे या गावातील कुळकर्ण्यांचे घर मोडून सोनांब्याच्या कुळकर्णीने जो वाडा तऱ्हाळेत बांधलेला आहे तो तोडून त्या जागेवरील असेल ती संपत्ती, वतनाचे कागदपत्र ताब्यात घेऊन त्यांना लष्करात येण्यास सांगावे. यासाठी सर्व व्यवस्था भिकाजी गोसावी यांनी पहावी तसेच या विषयीचा फिरून बोभाटा येऊ न देण्याची ताकीदही या हुकूमनाम्यात दिली आहे. याचे मूळ पत्र व हा संदर्भ एक अज्ञात व्यक्तींने नोंदविला आहे. हिरेखानाच्या वाड्याकडून भैरवनाथाच्या मंदिराकडे जाताना गावातील ब्रिटीशकालीन शाळा पहायला मिळते. ही शाळा लवकरच नवे रूपडे घेणार आहे. उजव्या हाताला एक मंदिर व त्यासमोर एक पेशवेकालीन विहीर आहे. येथे पाण्यासाठी महिलांची गर्दी पहायला मिळते.

सोनांबे गावचे मुख्य दैवत म्हणजे भैरवनाथ महाराज. भैरवनाथांचे मूळ गाभारा मंदिर दगडी बांधणीचे आहे. या मंदिरात छोटे दगडी देवघर आहे ते मूळ भैरवनाथ मंदिर म्हटले जाते. मंदिरावर द्वारपाल, माथ्यावर उभा गणपतीची मूर्ती, कळसाला वेढा घातलेला नाग अन् गणपती मूर्तीच्या दोन्ही बाजूने वाघांच्या प्रतिमा छोट्याखानी मंदिराला साज चढवितात. या दगडी मंदिराभवती मोठे मंदिर बांधले आहे. त्यावर कौले बसविण्यात आली आहेत. मंदिराच्या कामासाठी भगूर व घोटीकरांनी मदत केल्याचा उल्लेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे. मंदिरात लोखंडी दोन नगारे आहेत. मंदिराचा समोरचा मंडप सिमेंटचा बांधलेला आहे. मंदिरासमोरील दीपमाळ खूपच सुंदर असून, दीपमाळेवर पायांपाशी उठावदार नागाची प्रतिमा कोरलेली आहे. मंडपात अनेक समाधी आहेत. भैरवनाथाच्या यात्रेची सुरूवात पहिल्यादिवशी पालखी, रथ परंपरेने होते. संध्याकाळी काठ्या मिर‌विल्या जातात.

दुसऱ्या दिवशी कुस्त्या संध्याकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. बोहाडा ही परंपरा १५ वर्षांपासून बंद आहे. मात्र सोंगाचे मुखवटे दैवत म्हणून अनेकांनी जपले आहेत. गावात बाबुराव बाबा पवार यांची समाधीही आहे. त्यांचे वंशज बबन बाबुराव पवार यांच्याकडे बारागाड्या ओढण्याचा मान आहे. भैरवनाथ मंदिरामागे नागोबा काळेंची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज विश्रामगडावर असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नागोबा काळे यांच्याकडे होती. त्यांच्याकडे घोडा असल्याने त्यांना घोडे आडनाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यांना ‌छत्रपतींनी सोनांबे गावात जमीन जहागिरी म्हणून जमीन दिली होती. घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. खापराळे गावातील डोंगरावरील भवानी देवीलाही ग्रामस्थ मानतात. गावातील काळे-घोडे मंडळी देवीची पूजा करतात. गावात काशीआई, हनुमान मंदिर, राम ‌मंदिर, महादेव मंदिरासह इतरही अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. नाशिकरोडच्या अनुराधा थिएटरचे रामनाथ कलंत्री व इतर कलंत्री मंडळी या गावची.

भैरवनाथ मंदिराच्या डाव्या हाताला देवनदी व त्यावर ब्रिटीशकालीन बंधारा पहायला मिळतो. गावातून बाहेर पडताना हनुमान मंदिरातील वीरगळ अन् मंदिरामागील अहिल्याबाईंची बारव पहायला विसरू नका. आता आतापर्यंत बारवेचे पाणी ग्रामस्थ वापरत होते. मात्र त्यात खूप कचरा साचल्याने ती मृत अवस्थेत आहे. ही बारव स्वच्छ करून जपण्याची गरज आहे. बारवे शेजारीच गोसावींच्या समाधी आहेत. सिन्नर तालुक्यात गोसावी समाज सर्वच गावांमध्ये पहायला मिळतो. गोसावी समाज हा भटक्या जातीत मोडतो; मात्र आता हा समाज गावांमध्ये स्थिरावला आहे. गिरी, पुरी, गोसावी, गोस्वामी, भारती अशी आडनावे त्यांच्याच आढळतात. या समाजाला शंकराचे वरदान असल्याचे म्हटले जाते. सिन्नरमध्ये महाशिवरात्रीला हा समाज एकत्र येत शंकराची पूजा करतो. अनेक गावांमध्ये आजही गोसावी समाजातील प्रथा, परंपरा आजही भक्तीभावाने पाळल्या जातात. यात अगदी घरोघरी जोगवा मागण्याची पद्धत असो वा अंतविधीची प्रक्रिया असो. गोसावी समाजातर्फे सिन्नर परिसरातील काही गावांमध्ये मठाची स्थापनाही केलेली दिसते. यात सोनांबेचा समावेश होतो. गावात गोसावी व भारती आडनावाची मंडळीही आहेत.

संदर्भ :-

१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) https://vishwakosh.marathi.gov.in
३) डॉ. अंजली वेखंडे, चंद्रशेखर बुरांडे, सोपान वासुदेव गडाख, शैलेश पाटील,  बाळकृष्ण अंजनगावकर, किरण भावसार यांचे लिखाण
४) https://www.maayboli.com
५ ) https://divyamarathi.bhaskar.com
६) https://gargoti.com/





























Gargoti Mineral Museum, Sinnar near Pune [MUST Visit]


Gargoti museum, Sinnar entrance



Holidays are about to begin and you must be thinking of engaging children in various activities, I suggest to have one day trip to the Gargoti museum, Sinner on the way from Pune to Nasik (dist 186 kms) Also do visit Gondeshwar temple (1069 A. D) in Sinnar (see photos from my friend sameer)

Coming back to the museum, It is worth spending at least 2 hours to see all the ***, they have collection of moon rock, mars rock to the fossils, volcanic bombs, ruby, crystals, and what not .. collected through out the world, its amazing to see gods creations in a single place. Displays Worldwide Collection of: Natural Crystals, Zeolites, Minerals, Gem Stones, Precious/Semi-Precious Stones & Metals, Fossils; Statues & Handicrafts.

Gargoti museum, Sinnar bharat mata

Gargoti Museum timings :

9 a.m. To 8 p.m. (Open Everyday)

Entry Ticket :

60 Rs per Person.

Address :

D-59, MIDC Malegaon, Sinnar, Nasik 422113

and GPS co-ordinates are 19.871836,73.972405

Contact Phone numbers:

+91 9890655592, +91 2551 230866

you will also be able to purchase items made from these natural stones, going upto Ruby which shall cost you in thousands or even lacks !

Surely the collection is worth few crore rupees and a must see for.

Huge devi mata made out of plastic molding (joined in two pieces) located at the center of building

Crystals Gargoti museum, Sinnar

Soo many  photographs are added just to give you a flavor of what you will be able to see in the museum, Also the persons at the museum are knowledgeable about and tells each and every thing with full involvement which i liked the most. In fact they are willing to provide u as much information as they can.

Crystals Gargoti museum, Sinnar

Crystals Gargoti museum, Sinnar

Crystals Gargoti museum, Sinnar

Photograph added alongwith person just to give u an idea of size of the stone !

precious stones Gargoti museum, Sinnar

amethyst found at brazil

amethyst found at brazil

chocolate vpophyllite – found in Labaanon

chocolate vpophyllite - found in Labaanon

okenite with gyrolite – found at Malad, Maharashtra

okenite with gyrolite - Malad, Maharashtra

lord Ganesha carved out of Corundum ruby

lord Ganesha carved out of Corundum ruby

lord Ganesha carved out of clear quartz

lord Ganesha carved out of clear quartz

lord Ganesha carved out of smokey quartz

lord Ganesha carved out of smokey quartz

lord Ganesha carved out of rose quartz

lord Ganesha carved out of rose quartz

Swayambhu

G

aneshji found at Agate, Ajanta, Maharashtra

Swayambhu Ganeshji found at Agate, Ajanta, Maharashtra

lord Mahavira carved out of clear quartz

lord Mahavira carved out of clear quartz

Shivlinga carved out of clear quartz

Shivlinga carved out of clear quartz

Shivlinga carved out of clear quartz

Shivlinga carved out of clear quartz

Mars rock,January 2004

Mars rock,January 2004

moon rock found June 2009

moon rock found June 2009

tusk and tooth of mammoth, early elephant, Kutch,Gujarat,40 million years old

tusk and tooth of mammoth, early elephant, Kutch,Gujarat,40 million years old

volcanic bombs

volcanic bombs

fossils

fossils

apophyllite stilbite stalactite found at Jalgaon, Maharashtra

apophyllite stilbite stalactite found at Jalgaon, Maharashtra

apophyllite with stilbite found at Jalgaon, Maharashtra

apophyllite with stilbite found at Jalgaon, Maharashtra

apophyllite, stilbite chaleedony found at Jalgaon, Maharashtra

apophyllite, stilbite chaleedony found at Jalgaon, Maharashtra

Apophyllitecalcite with stilbite found at Jalgaon, Maharashtra

Apophyllitecalcite with stilbite found at Jalgaon, Maharashtra

art by god Apophyllite found at Aurangabad, Maharashtra

Apophyllite found at Aurangabad, Maharashtra

calcite found at Nasik, Maharashtra

calcite found at Nasik, Maharashtra

Gargoti museum Sinnar, Maharashtra

Gargoti museum Sinnar, Maharashtra

Gargoti museum Sinnar, Maharashtra

Gargoti museum Sinnar, Maharashtra

Gargoti museum Sinnar, Maharashtra

amethyst found at Brazil

amethyst found at Brazil

chocolate vpophyllite found in labaanon

chocolate vpophyllite found in labaanon

okenite with gyrolite found at Malad, Maharashtra

okenite with gyrolite found at Malad, Maharashtra

stllbite black chalcedony, geod found at Jalgaon, Maharashtra

stllbite black chalcedony, geod found at Jalgaon, Maharashtra

tanzanite merelani, Arusha district, Tanzania

tanzanite merelani, Arusha district, Tanzania

basaltic suveite lonar crater, district Buldhana, Maharashtra

basaltic suveite lonar crater, district Buldhana, Maharashtra

British minerals

British minerals

cavansite with calcite heulandite and stilbite found at Pune, Wagholi, Maharashtra

cavansite with calcite heulandite and stilbite found at Pune, Wagholi, Maharashtra

chalcedony found at Nasik, Maharashtra

chalcedony found at Nasik, Maharashtra

chocolate vpophyllite found in labaanon

chocolate vpophyllite found in labaanon

gold – Siberia,  russia

gold - Siberia, russia

Lapis Lazuh, Peridot, Pakistan

Lapis Lazuh, Peridot, Pakistan

okenite with gyrolite found at Malad, Maharashtra

okenite with gyrolite found at Malad, Maharashtra

red coral, Balearic Islands, Spain

red coral, Balearic Islands, Spain

Rhodochrosite with Tetrahednite, alma, colorado, USA

Rhodochrosite with Tetrahednite, alma, colorado, USA

samplesof impact glass from lonar crator,Buldhana, Maharashtra, about 15000 years old

samplesof impact glass from lonar crator,Buldhana, Maharashtra, about 15000 years old

scolecite on heulandite found at Nasik, Maharashtra

scolecite on heulandite found at Nasik, Maharashtra

scolecite

scolecite

Hope you will visit this place during summer holidays …. since it is near to pune and you may plan to goto Shirdi after visiting this place … so have a great time ….
cheers !!

https://trekbook.in/gargoti-museum-sinnar-pune/





 बाळकृष्ण अंजनगावकर 11/06/2016


महाराष्ट्राधीश असे स्वतःला अभिमानपूर्वक म्हणवून घेणारे एकमेव राजघराणे यादवांचे होय. त्या घराण्याने सुमारे पाचशे वर्षें (शके ७७१ – इसवी सन ८५० ते शके १२३३ – इसवी सन १३११) महाराष्ट्रावर राज्य केले. वैभवशाली राष्ट्र म्हणून त्या राज्याचा लौकिक आहे. यादव राजवटीतच ‘मराठी’ भाषा समृद्ध होऊन अनेकोत्तम साहित्यकृतींनी मराठीचे साहित्यभांडार अलंकृत झाले.

यादव राजे स्वतःस अभिमानाने श्रीकृष्णाचे वंशज म्हणवून घेत. यादवकुळाचा प्रारंभ पौराणिक दृष्टीने श्रीकृष्ण – प्रद्युम्न (मदन) – अनिरुद्ध – वज्र – प्रतिबाहु – सुबाहु असा आहे. पण ऐतिहासिक दृष्ट्या पहिला ज्ञात यादवराजा म्हणजे ‘द्दढप्रहार’. (शके ७७२ – इसवी सन ८५० ते शके ८०२ – इसवी सन ८८०). द्दढप्रहाराने स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर त्याचे स्वतःचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात निर्माण केले. ‘चंद्रादित्यपूर’(चांदवड, जिल्हा नासिक) ही त्याच्या राजधानीची पहिली नगरी.

नासिक जिल्हा, खानदेश व नगर जिल्ह्याचा काही भाग याला मध्ययुगात ‘सेऊण देश’ असे म्हणत. सेऊणदेश ही यादवांची पहिली भूमी. यादव हे गुजरातेतील द्वारकेहून आले. तसा उल्लेख जिनप्रभु ह्या जैन तीर्थंकारांनी लिहिलेल्या ‘नासिक्यकल्प’ ह्या ग्रंथात आलेला आहे. त्यात असे म्हटले आहे, की ‘द्वारकेच्या वज्रकुमार नावाच्या यादव क्षत्रियाच्या स्त्रीला जैन तीर्थकार चंद्रप्रभसाधु यांनी आश्रय दिला, तिचा पुत्र ‘द्दढप्रहार’ हा सामर्थ्यवान योद्धा झाला. त्याला लोकांनी ‘तलारपद’ (नगररक्षक, कोतवाल) दिले.’ नगररक्षक ‘द्दढप्रहार’च पुढे स्वपराक्रमावर स्वतंत्र राजा झाला.

यादवांचे सुमारे बत्तीस कोरीव लेख उपलब्ध आहेत. यादवांचा इतिहास समजावून घेण्याची साधने म्हणजे यादवराजांनी केलेले ताम्रपट, कोरलेले शीलालेख, हेमाद्री पंडिताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या संस्कृत ग्रंथातील ‘राजप्रशस्ती’ हा खंड व मध्ययुगीन मराठी ग्रंथसंपदा (उदाहरणार्थ, लीळाचरित्र, स्थानपोथी, ज्ञानेश्वरी).

द्दढप्रहाराने त्याच्या राज्याचा विस्तार चंद्रादित्यपूर (चांदवड) नगराच्या परिसरापासून थेट अंजनेरीपर्यंत (तालुका त्र्यंबकेश्वर) व चांदवडच्या दक्षिणेस सिंदीनेरपर्यंत (सिन्नर) केला. त्याच्या नंतर राजपदावर आला त्याचा मुलगा सेऊणचंद्र (प्रथम). तो वडिलांसारखाच पराक्रमी निघाला. त्याने त्याच्या राज्याच्या कक्षा आश्वी, संगमनेर (जिल्हा नगर)पर्यंत विस्तारल्या व त्याची राजधानी राज्यकारभाराच्या सोयीसाठी चंद्रादित्यपुराहून ‘सिंदीनेर’ म्हणून त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या नगरात आणली. सिन्नरचा प्राचीन साहित्यात ‘श्रीनगर’ असा उल्लेख आहे. सेऊणचंद्र (प्रथम) - (शके ८०२ ते ८२२) पासून त्याच्या नंतर धाडियप्प, भिल्लन (प्रथम), श्रीराज, वादुगी, धाडियप्प (द्वितीय), भिल्लम (द्वितीय), वेसुगी, अर्जुन, भिल्लम (तृतिय), वादुगी (द्वितीय), वेसुगी, भिल्लम (चतुर्थ), सेऊणचंद्र (द्वितीय), सिंघणदेव, मल्लुगी, भिल्लम (पंचम) याच्यापर्यंत (शके ११०७ ते १११५) अशी सुमारे तीनशे वर्षें यादवांची राजधानी ‘सिन्नर’ येथे होती. भिल्लम (पाचवा) याने यादवांची राजधानी शके ११०७ मध्ये सिन्नरहून देवगिरी (आताचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथे नेली व प्रसिद्ध देवगिरीच्या किल्ल्यावरून महाराष्ट्राचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.

यादवांचे राज्य उत्तरेस थेट नर्मदेपासून दक्षिणेस कृष्णा-कावेरीपर्यंत व पूर्वेस थेट नागपूर (विदर्भप्रांत) ते पश्चिमेस महिकावती (ठाणे, कोंकणप्रांत) पर्यंत विस्तारले होते. यादव राजांनी संपत्ती, वैभव, भूविस्तार निर्माण करून वैभवशाली राष्ट्र म्हणून महाराष्ट्रास हिंदुस्थानच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, वापी (बारव), प्रचंड सैन्य, सोने, मोती, राजवस्त्रे यांचे वर्णन हा स्वतंत्र ग्रंथाचा, लेखनाचा विषय आहे. राजधानी देवगिरी व देवगिरीचा किल्ला या संदर्भातही विस्तृत लेखन झालेले आहे.

सिन्नर शहराच्या दक्षिणेस ‘शिव’ नदी आहे. त्या शिवनदीकाठी सिंदीची झाडे होती. ती सद्य काळात तुरळक आढळतात. सिंदीच्या बनाशेजारी उत्तर बाजूस उंचावर वसलेले गाव म्हणजे ‘सिंदर’ होय. ‘गावठा’ म्हणून सिन्नरमध्ये जो भाग ओळखला जातो तो भाग म्हणजे सिन्नरची मूळ वस्ती होय. सेऊणचंद्राने ‘सेऊणपुरा’ या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वसती निर्माण केली असे वसई व आश्वी येथील ताम्रपटात म्हटले आहे.

 

श्रीमत्सेऊणचंद्रनाम नृवरतस्मादभूदभमिपः नित्यंदेशपदिधराजविषये स्वं नाम संपादनयन्।
येनाकारि पुरं च सेऊणपुरं श्रीसिंदीनेरे वरे तत्पुत्रः कुलदीपको गुणानिधी श्रीधाडियप्पस्त्रतः।।

असे अश्वी ताम्रपटात (शके १०२०) म्हटले आहे.

यादवांना ते सेऊणदेशाचे आहेत याचा अभिमान होता. शिवनदीचा उत्तर काठ ते सरस्वतीनदीचा दक्षिण काठ; तसेच, पूर्वेस सरस्वती नदी ते पश्चिमेस थेट शिवाजीनगर (बसस्टँड जवळचे) तेथपर्यंत पश्चिमेस असलेल्या त्यावेळच्या पारापर्यंत प्राचीन सिन्नर नगरीचा विस्तार होता. स्वतंत्र पेठा (पुर), वसाहती (राजवाडे, सामंतांचे राजवाडे, सैन्यतळ, हत्ती, घोडे यांचे हत्तीखाने व तबेले) यांनी यादवांची राजधानी गजबजलेली होती. त्याचे वर्णन ‘लीळाचरित्र’ या मराठी भाषेतील ग्रंथात (शके १२००) म्हाईमभट सराळेकर यांनी केलेले आहे.

‘श्रीनगर’मधील श्री म्हणजे संपत्ती, वैभव. श्रीनगर म्हणजे संपत्ती व वैभव यांनी संपन्न असलेले नगर. ‘ततः राजा नजराजधानी मधिष्ठितं श्रीनगरं गरीयः’ असे व्रतखंडाच्या राजप्रशस्ती श्लोक – २२ मध्ये सिन्नरला म्हटलेले आहे.

यादव राजे सुसंस्कृत व प्रजाहितदक्ष होते. त्यांनी राज्यविस्ताराबरोबरच भव्य राजप्रासाद, किल्ले, मठ, मंदिरे, वापी (बारव), तडाग (तळे) यांच्या निर्मितीकडे लक्ष दिले. ते राजे गेले पण त्यांनी, त्यांच्या सामंतांनी निर्माण केलेल्या वास्तू त्यांच्या कार्याची आठवण देत आहेत.

श्रीचक्रधरस्वामी व भिल्लममठ ही मंदिरसदृश पक्क्या दगडांमध्ये बांधलेली वास्तू सिन्नर शहरात चौदाचौकाचा वाडा (राजे फत्तेसिंहवाडा) या भागात आहे. महानुभव पंथ संस्थापक भगवान श्रीचक्रधरस्वामी यांचे या भिल्लममठात शके १९९०-९१ मध्ये दहा महिने वास्तव्य झाले. त्यामुळे ते महानुभाव पंथीयांचे देवस्थान ठरले आहे. वास्तू उत्तराभिमुख आहे. ती महानुभव श्रीदत्तमंदिर किंवा श्रीकृष्णमंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीनगरी भिलमठी अवस्थान (लीळा पूर्वार्ध – २३६) या लीळेत ते वर्णन आहे. मंदिराचा भव्य गाभारा व दगडी खांबांची ओसरी अशी ती भक्कम वास्तू यादव राजा, भिल्लम (तृतीय) याने शके ९४८ (इसवी सन १०२६) मध्ये निर्माण केली. त्याच्या नावावरून ते मंदिर ‘भिल्लममठ’ या नावाने प्रसिद्ध आहे. मठाला चारही बाजूंनी दगडी परकोट होता व पूर्वाभिमुख प्रवेशद्वार होते. त्याच मठात मराठी भाषेची आद्यस्त्री कवयित्री महदंबा व महानुभव पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांचे रामसगाव (जिल्हा जालना) येथून आगमन झाले. त्यांनी शके ११९१ मध्ये चैत्र महिन्यांत ‘दवणा’ ह्या सुगंधी झाडाची पाने, फुले श्रीचक्रधरस्वामींना अर्पण करून ‘दमणक पर्व’ साजरे केले.

श्रीचक्रधरस्वामींनी केलेले तत्त्वनिरूपण, त्यांच्या दहा महिन्यांच्या काळातील लीळा यांचे वर्णन मराठी भाषेचा आद्य गद्य ग्रंथ लीळाचरित्र यामध्ये (पूर्वार्ध लीळा क्रमांक २३५ ते २४६) आलेले आहे; तसेच, त्या काळात स्वामी सिन्नरच्या परिसरातील ज्या ज्या ठिकाणी (मठ, मंदिरे आदी) गेले त्यांचे वर्णन ‘स्थानपोथी’ (शके १२७५) या ग्रंथात आलेले आहे. भिल्लममठ माद्री (शके ११९२ ते १२३५) याच्या आधीपासून होता. त्यामुळे त्याला हेमाडपंथी देऊळ म्हणता येत नाही. ‘भिल्लममठ’ किंवा श्रीदत्तमंदिर सुस्थितीत असून त्या मूळ वास्तूस धक्का न लावता सभामंडपासह मंदिरनिर्मिती करण्यात आली आहे. ते मंदिर श्रीचक्रधरस्वामींच्या निवासाने, आसनाने व लीळांनी पावन झाले आहे. तेथे स्थान निर्देशक ओटे (पंथीय भाषेत स्थान) असून मुख्य स्थानाच्या जागी श्रीकृष्णमूर्तीची स्थापना केलेली आहे. भिल्लममठाचे पट्टीशाळेत (दगडी पडवी) शके १४१५ मध्ये कवी संतोषमुनी यांनी ‘रुक्मिणीस्वयंवर’ या ग्रंथाची पूर्णता केली.

गोंदेश्वर मंदिर ही ‘पंचायतन’ पद्धतीची भव्य वास्तू यादवांचे सामंत गोविंदराज यांनी शके ९९० च्या दरम्यान निर्माण केलेली आहे. गोंदेश्वर मंदिर हे सिन्नरचे वैभव आहे. शांत, एकांतस्थळी असलेल्या या मंदिरात श्रीचक्रधरस्वामी गेले होते. चौकात डावीकडे त्यांचे आसन झाले व मंदिरापुढे असलेल्या मंदिराच्या निर्मितीची कथा (पद्मेश्वर मंदिर, आताचे मुक्तेश्वर मंदिर, सिन्नर-शिर्डी रस्ता) त्यांनी भक्तांना सांगितलेली आहे (पूर्वार्ध लीळा क्रमांक २४५ गोंदेश्वरापुढे पद्मेश्वरू कथन).

सरस्वती नदीच्या दक्षिण काठावर असलेले आवेश्वर मंदिर प्राचीन पूर्वाभिमुख मंदिर, हल्ली ऐश्वरेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या उत्तर पट्टीशाळेत श्रीचक्रधारस्वामींचे आसन झालेले आहे.

यादवकालीन चतुर्विधांचे मंदिर या नावाची प्राचीन वास्तू सरस्वती नदीच्या दक्षिणकाठी होती. चतुर्विधाचा मठ मातीत दबलेला होता. तेथे स्वामींचे आसन झालेले आहे. मठाच्या ठिकाणी ‘पट्टीशाळा मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर व चतुर्विधाच्या मठाची उर्वरित वास्तू आहे.

वैजनाथाचे मंदिर ही यादवकालीन वास्तू शीव नदीच्या दक्षिण काठावर होती. तेथे स्वामींचा तीन दिवस निवास झालेला आहे. मूळ वास्तूच्या चौकाच्या ठिकाणी ‘भोजनता मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर आहे. तेथेच यादवसम्राट महादेवराय यादव हा पुढे देवगिरीहून मुद्दाम घराण्याच्या मुळच्या राजधानीच्या ठिकाणी आला होता (शके ११९०). त्याचा उल्लेख लीळाचरित्र, पूर्वार्ध लीळा क्रमांक २३७ मध्ये आलेला आहे. महादेवराय यादवाने श्रीचक्रधरस्वामींच्या दर्शनाच्या हेतूने भिल्लममठात त्याचा सेवक पाठवला होता. तेव्हा स्वामी पट्टीशाळेत खांबाजवळ गुजराती भाषेत त्या सेवकाशी बोलले. तो पवित्र खांब वंदनीय झाला! तेथे व जेथे श्रीनगरदेवाचार्य व महदाईसा यांना स्वामींचे प्रथम दर्शन झाले त्या ठिकाणी पवित्र स्थानांचे ओटे आहेत. भिल्लममठ ही पवित्र वास्तू व श्रीचक्रधरस्वामींचे ‘महास्थान’ यांना वंदन करण्यासाठी भारतभरातून भक्त येतात.

चिंचोली (तालुका सिन्नर) हे गाव सेऊणचंद्र  - द्वितीय (शके ९७२ ते १००२) याने सर्वदेवाचार्य या राजगुरूस दान दिले होते. त्या दानाचे व चिंचोली गावाच्या चतुःसीमांचे वर्णन वसईचा ताम्रपट यात आलेले आहे.

 

‘सकलपरिग्रह विदितं सिंहिग्रामद्वादसके चिंचुली ग्रामः प्रदत्तः तस्य आघाटनानि पूर्विदग्भागे डोंगर दत्तं... दक्षिणे चिंचाला नाम तडागः।
नइऋत्ये वडगम्भाग्राम।
पश्चिमे तलेठिलीपर्यंतः उत्तरोत्तु सिंसि ग्रामीयडोंगर दत्तं तथा वटवृक्षर्चः’

वडगाव (पिंगळा, तालुका सिन्नर), शिंदे (तालुका जिल्हा नासिक) ही गावे चिंचोली गावाच्या भोवताली आहेत. ताम्रपटामुळे त्या गावांचेही प्राचीनत्व लक्षात येते.

यादवकाळापासून सिन्नरशी असलेले महानुभाव पंथाचे अनुबंध पुढेही टिकले. केशिराजबास यांनी लीळाचरित्रातील लीळांचे ‘रत्नमाळास्तोत्र’ या नावाने संस्कृतमध्ये काव्यरूपाने शके १२१० मध्ये वर्णन केले. मुरारीमल विद्वांस या आचार्यांची सिन्नर येथे एका गुजराती स्त्री भक्ताने शके १५०० मध्ये पूजा केली असे ‘वृद्धाचार’ या ग्रंथात वर्णन आलेले आहे.

श्रीचक्रधरस्वामींनी सिंघण, कृष्णदेवराय, महादेवराय, आमणदेव, रामदेव अशा पाच राजांची राजवट (शके ११४० ते ११९६) पाहिलेली आहे. स्वामींचा त्या राजांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. कृष्णदेव (शके १९८०) व महादेव (शके ११८३) यानी तर स्वामींची आदरपूर्वक पूजा केलेली आहे. श्रीचक्रधरस्वामी व त्यांचा महानुभव पंथ अशा रीतीने यादवकाळाशी संबंधित आहे.

- बाळकृष्ण अंजनगावकर

लेखकाचा दूरध्वनी

94235 42773

(अभ्यासाची साधने – लीळाचरित्र, स्थान पोथी, देवगिरीचे यादव – लेखक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, प्राचीन मराटी कोरीव लेख – लेखक डॉ. शं.गो. तुळपुळे, महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास – डिखळकर)

महानुभाव पंथाच्या सिन्नरमधील खुणा


भगवान श्रीचक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ स्थापन केला. महानुभाव पंथ महाराष्ट्रात एक हजार वर्षांपूर्वी उगम पावला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. महानुभाव पंथ श्रीदत्तात्रेय प्रभू यांच्यापासून म्हणजे कृतयुगापासून चालत आलेला आहे असे मानतात. भगवान श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेयप्रभु यांच्यापासून ज्ञानशक्ती स्वीकार केलेले चक्रपाणी महाराज शके १०४३ (इ.स. ११२१), श्रीगोविंदप्रभु शके ११०९ (इ.स. ११८७) व श्रीचक्रधरस्वामी शके ११४२ (इ.स. १२२०) अशी अवतार परंपरा आहे. त्यांना ‘पंचकृष्ण’ असे म्हणतात. त्या पंचकृष्णांचा निवास जेथे झाला, ते आसनस्थ जेथे झाले त्या जागांस ‘स्थान’ असे म्हणतात. ती स्थाने पवित्र मानली गेली आहेत. लोकांनी तेथे महानुभाव पंथातील मंदिरे बांधली आहेत.

श्रीचक्रधर स्वामींचा उपदेश, त्यांचे विचार सातशे वर्षापूर्वीच्या बोलीभाषेत लिहिलेल्या एका ग्रथांत आहेत. त्या ग्रंथाला ‘लिळाचरित्र’ असे संबोधतात. सत्य, अहिंसा, समता आणि ममता यांची दिव्य शिकवण देणारे महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान श्रीचक्रधर स्वामी यांचे मराठी भाषेवरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांचे पशुपक्ष्यांवर, प्राण्यांवर प्रेम होते. त्यांनी महाराष्ट्रभर पायी प्रवास करून गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर असलेल्या गावांना भेटी दिल्या. ते वेगवेगळ्या खेड्यापाड्यांत गेले. तेथील गरीब, साध्याभोळ्या स्त्री-पुरूषांमध्ये मिसळले;  त्यांच्या सुखदुखाशी समरस झाले.

भगवान श्रीचक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील. हरिपाल देव हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म शके १११६ ( इ.स. ११९४ ) मध्ये झाला. ते गुजरातमधील भरूच येथील विशालदेव प्रधान यांचे पुत्र, मालनदेवी हे त्यांच्या आईचे नाव. हरिपाल देव हा राजकुमार बालवयापासून शूर, धाडसी होता. महाराष्ट्रातील सिंघणदेव या यादवराजाने जेव्हा गुजरातवर स्वारी केली तेव्हा त्या युद्धात हरिपाल देवाने भाग घेतला होता. त्याने राज्यकारभारात प्राविण्य संपादन केले होते. त्यांनी श्रीगोविंदप्रभू यांच्याकडून ज्ञानशक्तीचा,जीवोद्धरण शक्तीचा स्वीकार केला व एकांतवास सुरू केला. ते सालबर्डी (ता. मोर्शी) च्या घनदाट जंगलात बारा वर्षें राहिले. त्यांनी राजा भर्तृहरीची भावजय मुक्ताबाई हिची पूजा स्वीकारली. त्यामुळे त्यांचे शरीर सदैव तरूण व तजेलदार दिसे. नंतर ते गोंडमध्ये गेले. त्यांनी आंध्रप्रदेश व कर्नाटक प्रांतांतही संचार केला.

स्वामींचे विचार अभिनव होते. त्यांनी म्हटले, ‘परमेश्वर व जीव हे परस्परांपासून भिन्न आहेत. परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ असून, जीवाचा उद्धार करणारा आहे. यासाठी जीवाने अनन्यभावाने परमेश्वराची भक्ती करावी. त्यासाठी यज्ञयाग आदी कर्मकांडाची आवश्यकता नाही.’ स्वामी हे जरी परमेश्वराचे अवतार होते तरी ते त्यांच्या संचारकाळात जनसामन्यांमध्ये मिसळले  त्यांच्या सुखदु:खाशी एकरूप झाले -त्यांची काळजी वाहिली. ते सर्वांचे हितकर्ता झाले. त्यांनी मराठी आणि महाराष्ट्र यावर प्रेम केले. त्यांनी मनुष्याप्रमाणे प्राणिमात्रांची काळजी घेतली.

चक्रधरस्वामींमुळेच महानुभाव पंथातील लोकांनी चार हजारपर्यंतची ग्रंथनिर्मिती केली. व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, हे तत्त्व महानुभाव पंथात आहे. त्या पंथांची श्रद्धा वैदिक धर्मावर नसली तरी महानुभाव पंथीयांना वैदिक धर्माबद्दल आस्था आहे. महानुभावांचा चातुर्वर्ण्यावर एक सामाजिक गरज म्हणून विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख काही नियम म्हणजे प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत.

महानुभाव पंथाची काही चरणांकित तीर्थस्थाने नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातही आहे. महानुभाव पंथाच्या ‘पंचकृष्णां’पैकी चक्रधर स्वामी यांचा चरणस्पर्श सिन्नर तालुक्यात चौदा चौकाचा वाडा, भोजनतळ, पट्टीशाळा, गोंदेश्वर मंदिर, महानुभाव मंदिर (खोपडी) या स्थानी झाला. तेथे त्यांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. खोपडी येथील महानुभाव मंदिरात चक्रधर स्वामींचा काल्पनिक चेहरा बनवला गेला आहे. तो चेहरा चौथऱ्याजवळच आहे. तेथे चैत्र पौर्णिमेच्या वेळी तीन दिवस जत्रा असते. तीन दिवसांच्या त्या जत्रेत त्या पुतळ्याची देऊळ गाडीवरून जवळच्या गावांत मिरवणूक काढली जाते. मंदिरात जे भाविक दर्शनासाठी येतात ते स्वामींच्या चरणी विडा अर्पण करतात. त्या विड्यात दान, सुपारी आणि नारळ या वस्तू असतात. महानुभाव पंथातील लोकांना मांसाहार व कोठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास मनाई आहे.

- शैलेश पाटील

('थिंक महाराष्‍ट्र'कडून महानुभाव पंथाच्‍या सिन्‍नर तालुक्‍यातील खुणांचा आणखी शोध घेतला जात आहे. अधिक माहिती उपलब्‍ध होताच ती लेखात समाविष्‍ट करण्‍यात येईल.)

देवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास

See author's posts

_Devpur_2.jpg

देवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे. त्या परंपरेतील संत बाबा भागवत महाराज यांचा जन्म देवपूर गावी झालेला आहे. भागवत बाबांच्या जन्माचा भाग अनेक चरित्रकारांनी रसाळ पद्धतीने रंगवलेला आहे.

देवपूर गाव देवनदी तीरावर वसले आहे. गावाच्या चौफेर हिरवीगार झाडी आहे. त्या वनराईच्या आश्रयाने अनेक त-हेचे पशू–पक्षी वास्तव्य करून आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचा पक्षी म्हणजे मोर. ब्रिटिशांनी देव नदीवर कालवा बांधला. नदीतील पूरपाणी गावानजीकच्या शेतीला त्या कालव्यातून पुरवले जाते. त्यामुळे गावाचा बराचसा भाग हा ओलिताखाली आला.

गावामध्ये विविध जाती-धर्मांचे लोक आहेत. मराठा, जरेमाळी, मांग, महार, ढोर, परिट, भिल्ल, चांभार, सोनार, मारवाडी, कोळी, ब्राह्मण इत्यादी जातींचे लोक एकत्र राहतात.

सिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या विडी उद्योगाचे काही कारखाने देवपूर गावामध्ये पूर्वी चालत. परंतु विड्यांची मागणी कमी होत असल्याने तो उद्योगधंदा मंदीच्या मार्गावर आहे.

देवपूरात वर्षभरातून दोन वेळा यात्रोत्सव पार पडतो. यात्रा म्हणजे गावकऱ्यांसाठी जणू ती पर्वणी असते! चैत्र शुद्ध पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी संत बाबा भागवत महाराज पालखीची ग्रामप्रदक्षिणा सुरू होते. त्या दिंडी सोहळ्यासाठी देवपूर, धारगाव, फर्दापूर, पंचाळे, शिंदेवाडी या पंचक्रोशीतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. टाळ, मृदंग, वीणा या वाद्यांच्या तालात दिंडी प्रदक्षिणा सुरू असते. पालखी पहाटे पाच वाजता ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून मंदिराच्या गाभाऱ्यात येते. कावडीची मिरवणूक दुसऱ्या दिवशी होते. त्यासाठी भाविक ग्रामस्थ गोदावरीचे पाणी पायी जाऊन घेऊन येतात व गावातील देवतांना त्या जलाने स्नान घालतात. त्याच दिवशी कुस्त्या होतात. सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असतो. काल्याच्या कीर्तनाने यात्रेचा शेवट तिसऱ्या दिवशी होतो.

श्रावण महिन्यामध्ये सव्वा महिना महादेवाच्या मंदिरात अखंड नंदादीप तेवत ठेवतात. गावातील प्रत्येक कुटुंबातून नंदादीप लावला जातो. ते दीप लावण्याचे काम गावातील गुरव समाजाचे लोक करतात. त्या बदल्यात त्यांना दक्षिणा दिली जाते. अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्रावण पंचमीच्या दिवसापासून गावामध्ये केले जाते. गावातील वाड्यानुसार पहारा (वीणा किंवा टाळ यांचा नाद अखंड सुरू ठेवणे) दिला जातो. सात दिवस सायंकाळी सहा ते सात या वेळेत हरिपाठ होतो. रात्री नऊ वाजता कीर्तन, पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होते. श्रावण वद्य एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाचा समारोप होतो.

_Ranekhan_Wada_1.jpg


गावातील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सव मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीच्या दिवशी भरतो. त्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे खंडेराव महाराजांचा भगत बारा बैलगाड्या ओढत आणतो. जागरण, गोंधळ यांसारखे महत्त्वाचे कार्यक्रम (विधी) उत्सवात पार पाडले जातात. त्र्यंबकेश्वर येथे होणा-या निवृत्ती महाराज यात्रेसाठी श्री क्षेत्र बेलापूर येथून सुमारे चारशे वर्षांपासून पायी दिंडी सोहळा पौष महिन्यामध्ये आयोजित केला जातो. त्यासाठी लागणारी शिधासामग्री, बैलांसाठी चारा ही व्यवस्था गावकरी करतात. श्री क्षेत्र देवपूर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा असतो. शेकडो भाविक त्या सोहळ्यात सहभागी होतात.

पंचक्रोशीतील लोक बाबा भागवत महाराजांच्या दर्शनासाठी प्रत्येक एकादशीला येतात. संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होतो. गावामध्ये नवरात्रोत्सव, गणेशोत्सव हे देखील मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

देवपूरला पौराणिक ऐतिहासिक महत्त्वही आहे. अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 रोजी झाले. त्या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला. त्या गदारोळांत दोन व्यक्ती बचावल्या. त्यांपैकी नाना फडणवीस अंगाला राख फासून बैराग्याच्या झुंडीत घुसले तर महादजी शिंदे तोफेचा गोळा लागल्याने जखमी अवस्थेत पडले होते. राणेखान हे शिंद्यांच्या फौजेत पखालीवरून पाणी वाहण्याचे काम करत.त्यांनी महादजींना उचलून त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केला आणि त्यांचे प्राण वाचवले. राणेखानने शत्रूपासून लपत-छपत मैलोगणिक प्रवास केला व त्याने त्याच्या मुलुखात महादजींना आणले. महादजींनी राणेखानने दाखवलेल्या स्वामीनिष्ठेमुळे त्याला सरदारकी व जहागिरीही प्रदान केली. त्यांत सिन्नर तालुक्यातील देवपूर, पिंपळवाडी, निमगाव, पास्ते या गावांचा समावेश होता. राणेखानने त्यांपैकी देवनदीच्या किनारी वसलेल्या निसर्गसंपन्न देवपूर गावाची वास्तव्यासाठी निवड केली. राणेखानने देवपुरात काही वास्तूंचे बांधकाम केले. संपूर्ण देवपूरला कोट बांधून त्यात दिवाणखाना, नगारखाना, कबुतरखाना, दारूखाना, मशीद आणि मंदिर या वास्तूही बांधल्या. गावाला लागून असलेल्या देवनदीच्या पलीकडील तीरावर कोट बांधून तेथे बडाबाग नावाचे शाही कबरस्थान बनवले आहे. त्या बडाबागेतच राणेखानची भव्य कबर आहे.

– सोपान वासुदेव गडाख

देवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला!

See author's posts

carasole

राणेखानची ऐतिहासिक समाधी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात देवपूर गावी उभी आहे. त्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्या समाधिस्‍थळास ‘बडाबाग’ असेही नाव आहे. मात्र स्‍थानिक पातळीवर ते स्‍थळ ‘राणेखानचा वाडा’ या नावाने ओळखले जाते.

देवपूर गावाची महती तीन नावांनी प्रसिद्ध आहे. गावाला राजकीय दृष्टिकोनातून नाना गडाखांचे देवपूर असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने, ‘बाबा भागवतांचे देवपूर’ असा उल्लेख केला जातो. तर ऐतिहासिक दृष्टीने ‘ते गाव ‘राणेखानचे देवपूर’ म्हणून ओळखले जाते. राणेखानचे वंशज देवपूर येथे राहत नाहीत. मात्र राणेखानबद्दलची संक्षिप्त माहिती गावातील कबरीच्या दर्शनी भिंतीवर कोरलेली आहे.

पानिपतची तिसरी लढाई मराठे व अहमदशहा अब्दाली यांच्यात जानेवारी 1761 मध्ये झाली. लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे सेनापती महादजी शिंदे जबर जखमी झाले. त्यांना राणेखान याने पाणक्याचा वेश धारण करून सुरक्षित ठिकाणी हलवले व त्यांच्यावर उपचार करून त्यांचा जीव वाचवला. महादजी शिंदे यांनी राणेखानच्या धाडसाचे कौतुक पेशवे दरबारात केले. त्या उपकारांची परतफेड म्हणून त्याला पैसा, जडजवाहिर, हत्ती, घोडे व निमगाव, देवपूर आणि जामगाव पास्ते या गावांची जहागिरी दिली. राणेखानने देवपूर गावात अनेक वाडे व हवेल्या बांधल्या. तसेच, त्याने संत श्री बाबा भागवत महाराजांच्या संस्थानाजवळ एक मशीद व मंदिर बांधून, हिंदू-मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. राणेखानने बंधारे बांधून देवपूर परिसर समृद्ध केल्याचे दाखले आहेत. राणेखानचे निधन 22 डिसेंबर 1791 रोजी झाले.

राणेखानने देवपूर गावातून वाहणा-या देवनदीच्या पश्चिम किनाऱ्यालगत निसर्गरम्य जागेत ‘बडाबाग’ हे शाही कब्रस्तान बांधले होते. कबरीचे आवार सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील देवपूर फाटयापासून साधारण तीनशे मीटर अंतरावर सुरू होते. त्या आवाराच्या पश्चिमेकडील पुरुषभर उंच तटबंदी, घडीव दगडातील दरवाज्याची कमान व अन्य अवशेष यांमधून जाणवणाऱ्या गूढ वातावरणाच्या सान्निध्यात, राणेखानच्या समाधिस्थळाचा ‘सौंदर्यानुभव अधिक आकर्षक वाटतो. राणेखानच्या समाधीजवळ आणखी दोन समाधी आहेत. त्यांपैकी एक त्याच्या आई-वडिलांसाठी व दुसरी एका नर्तकीसाठी बांधण्यात आली होती. त्या आवारात समाधीसारख्या दिसणाऱ्या इतर वास्तू व चबुतरे यांचे अवशेष आहेत. आवारातील सर्व जागा दगडी पायवाटेने एकमेकांस जोडल्या गेलेल्या आहेत. काटकोनातील मोकळ्या जागेत कारंज्यांनी सजवलेले हौद व निरनिराळी झाडे यांमुळे ती जागा त्या काळी अधिक शोभिवंत दिसत असावी. परिसरात पेरु, चिंच व डाळिंब यांच्या बागा असल्याने शेकडो मोर वास्तव्यास आहेत. राणेखानने त्याचे मरणोत्तर जीवन प्रसन्न, शांत व सर्वांगसुंदर स्थळी जावे म्हणून त्या जागेचा आराखडा व त्यातील वास्तू, स्थापत्यकलानिपुण, कला-संवेदनशील कलाकाराकडून बनवून घेतल्या असाव्यात याचा प्रत्यय ते स्थळ पाहताना पावलोपावली येतो.

साधारणत: पराक्रमी वीर पुरुषांची समाधिस्थळे कणखर व राकटपणाचे दर्शन घडवतात, पण राणेखानची समाधी त्या बाबतीत वेगळी ठरते. त्याने स्वत:साठी बांधलेले समाधिस्थळ, आकाराने भव्य नसले तरी ते कला-सौंदर्यपूर्ण स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या समाधीसाठी वापरलेला फिकट पिवळसर भुरकट रंगातील दगड हा पोरबंदर – गुजरात -येथील, लाईमस्टोन व सँडस्टोन यांच्याशी मिळताजुळता दिसतो. जमिनीपासून सहा फूट उंच चौथऱ्याचा भाग, समाधीची जोत्यापर्यंतची रचना, त्यावरील कोरीव व लयबद्ध आकृतिबंध पाहणाऱ्याला गुंतवून ठेवतात. चौथऱ्यावरील समाधीभोवतीची मोकळी जागा समाधिस्थळाच्या भव्यतेत भर घालते. समाधीच्या चारही दिशांना भिंतीच्या सम आकारातील पोकळीत दरवाजे बसवले आहेत. त्यावर कोरलेली अनेक पदरी महिरप, दरवाज्याची दुपदरी दगडी चौकट, अर्धगोलाकार कमान व आयताकृती चौकटीतील भिंतीचा पृष्ठभाग तासून साधलेले कोनाडे आणि भिंतीपासून पुढे ओढलेल्या तळभागातील दगडी पटट्यांवरील ठळक कोरीव नक्षीकाम प्रेक्षकाला भान विसरायला लावते. चारही कोनाडयांतील भिंतींचे पृष्ठभाग, भिंत व छताचे सांधे जेथे मिळतात त्या कोपऱ्यांत फिटट् बसवलेले दगडी पुष्पकळ्यांचे आकृतिबंध व दगडात कोरलेला फुलांच्या देठाएवढा फुगवट्याचा भाग स्थापत्यकलेतील लवचीकतेचे उदाहरण आहे. बहु अर्धगोलाकारातील आयताकृती दगडी चौकटीत बसवलेल्या कमानीला धरून ठेवणारे दोन्ही बाजूंचे स्तंभ ही मुघल वास्तुकलेची शैली समजली जाते. चारही दिशांच्या दर्शनी भिंतींवरील कमानी व त्यात कोरलेले नाजूक आकृतिबंध आणि कोपऱ्यातील खाचेत बसवलेल्या रेखीव स्तंभाची रचना कलासक्त नजरेतून निर्मिलेला आविष्कारच वाटतो! समाधीच्या घुमटाचा कळीदार पाकळ्यांतून बनवलेला बाह्यभाग व छताचे चारी कोपरे आणि दरवाज्याच्या माथ्यावरील कमी-अधिक उंचीचे मनोरे त्या समाधिस्थळाचे सौंदर्य समृद्ध करतात. समाधिस्थळाच्या जोत्याच्या चारी बाजूंच्या पृष्ठभागावरील व छताच्या उतरत्या सज्ज्यावरील आकृतिबंधातील नक्षीकाम व इतर घटक पाहणाऱ्याची नजर खिळवून ठेवतात. सुंदर निळे आकाश, काटेरी बाभूळ व कडुनिंबाच्या सावलीत कलासंवेदनशील कलावंताने घडवलेले ते दगडी शिल्प, दिमाखाने उभे आहे.

समाधीची अंतर्गत रचना कलात्मक व मन प्रसन्न करणारी आहे. चारही दिशांतील दरवाज्यांचा काटकोन साधून समाधीच्या मधोमध ठेवलेला पांढऱ्या रंगातील चबुतरा लक्षवेधक आहे. भिंतीच्या अंतर्भागावर पांढऱ्याशुभ्र चुन्याच्या गिलाव्यात केलेल्या कोनाड्यांचे लहान-मोठे छाप व आकृतिबंध यांतून साधलेली लयबद्धता या गोष्टी त्या जागेची मर्यादा विस्तारण्याचे काम करतात. समाधिस्थळाच्या सम दरवाज्याची रचना व पांढरा रंग यांमुळे परावर्तित सूर्यप्रकाश त्या वास्तूत सूर्यास्तापर्यंत राहतो. पश्चिमेकडील दरवाज्याच्या चौकटींची फिकट हिरवी रंगछटा त्या जागेत चैतन्य फुलवण्याचे काम करते. घुमटाच्या आतील व चौकटीच्या भागावरील कोरीव कामात विविधता दिसते. समाधीच्या अंतर्बाह्य पृष्ठभागावरील लहानमोठया आकारातील सम आकृतिबंधांच्या पुनरावृतीत त्या स्थळाचे खरे ‘सौंदर्य दडलेले आहे. त्या अभिजात वास्तुकलेत परिसरातील रुक्षपणा विसरवण्याची क्षमता आहे.

राणेखानने स्वत:च्या वास्तव्यासाठी देवपूरची निवड केली होती. त्याने तेथे बांधलेली चार मजली हवेली अवशेषरूपात उरली आहे. त्या वाडयात, दहाएक वर्षांपूर्वी विड्या वळण्याचे काम होत असे व काही वर्षांपूर्वी त्या जागेचा उपयोग गोदामासाठी केल्याचे कानावर आले. देवपूर गावाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या वेशीचे चिरे ढासळले आहेत, तर वेशीचे जीर्ण दरवाजे लेचापेच्या आधारावर उभे आहेत.

राणेखानचे समाधिस्थळ, ज्या काळात बांधले होते ते जसेच्या तसेच आहे! काही घडीव चिरे ढासळले आहेत, पण त्यांचे प्रमाण कमी आहे.

– चंद्रशेखर बुरांडे

(छायाचित्र – चंद्रशेखर बुरांडे)

Last updated on 11 Nov 2017

About Post Author

चंद्रशेखर बुरांडे

चंद्रशेखर बुरांडे हे आर्किटेक्ट आहेत. ते स्वतंत्र प्रक्टिस करतात. ते कन्सल्टंटही आहेत. ते मुंबईतील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. तसेच, विविध माध्यमांतून लोकांशी संवाद साधतात. ते लोकांना वास्तुशास्त्रातील सौंदर्य समजावे यासाठी प्रयत्नशील असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9819225101


सिन्नर : महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील एक नगर व त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. त्याचा सिंदिनगर, सिंदिनेर, सेऊणपूर, श्रीनगर वगैरे नावांनी उल्लेख आढळतो. लोकसंख्या ६५,२५१ (२०११). ते पुणे— नासिक रस्त्यावर नासिकच्या आग्नेयीस सु. २७ किमी.वर वसले आहे. मध्ययुगात नगराभोवती मातीची तटबंदी होती पण ती आता जवळजवळ नामशेष झाली आहे. सिन्नरचा उल्लेख १०६९ च्या ताम्रपटात सिंदिनेर असा आढळतो. गवळी राजा राव शिंगुणी याने हे नगर वसविले, अशी एक परंपरागत कथा आहे. तोच ताम्रपटातील सेऊनेन्डू असावा. याचा अंतर्भाव सेऊण देशात होत असल्यामुळे त्यावर यादव (सेऊण) वंशाची (११८५— १३१८) सत्ता होती व बाराव्या शतकापर्यंत सिन्नर (श्रीनगर) हे यादवांच्या राजधानीचे स्थळ होते. सतराव्या शतकात मोगलांची सत्ता या नगरावर होती व त्यांच्या चौदा ठाण्यांपैकी हे एक लष्करी ठाणे होते. अमृतराव देशमुख हा त्याचा मुख्य सरदार होता आणि त्यानेच ही मातीची तटबंदी बांधली व नदीला धरण बांधले. त्याच्या वाड्याचे अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत. मराठ्यांनी त्यावर १७९० मध्ये वर्चस्व मिळविले. पेशवाईच्या अवनतीनंतर (१८१८) ते इंग्रजी अंमलाखाली स्वातंत्र्यपूर्व काळात होते.

शिव आणि सरस्वती या नद्यांमुळे शहराच्या आसमंतातील जमीन ओलिताखाली आली आहे. या दोन नद्यांचा संगम जवळच आहे. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गहू , बाजरी, तंबाखू, ऊस, भुईमुग ही काही प्रमुख पिके होत. याशिवाय विड्याची पाने व भात यांचे उत्पादन घेतले जाते. सिन्नर हे जिल्ह्यातील एक प्रमुख विणकाम केंद्र असून शहरात अनेक यंत्रमाग आहेत. त्यांपैकी काही विणकरांनी सहकारी उद्योगसमूह स्थापन केले आहेत. एके काळी शहरात विडी वळण्याचा उद्योग तेजीत होता. विड्या वळण्याचे पाचहून अधिक कारखाने असून, त्यावेळी अनेकांना रोजगार उपलब्ध झाला होता. येथील विड्या कर्नाटक व गोव्यात विशेष प्रसिद्घ होत्या.

नगरपालिकेची स्थापना (१८६०) झाल्यानंतर शहरात आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, जलनिःसारण वगैरे बाबींबरोबर प्राथमिक शाळा व नगरपालिकेमार्फत चालविले जाणारे रुग्णालय इ. सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भूमिगत जलनिःसारण योजना येथे कार्यान्वित आहे. शहरात पाच माध्यमिक विद्यालये असून तीन महाविद्यालये आहेत. महाविद्यालयांपैकी दोन कला, वाणिज्य व शास्त्र विषयांची असून एक व्यवस्थापन व संगणक अभ्यासक्रमाचे आहे.

शहरात लहान मोठी काही मंदिरे असून त्यांपैकी दोन मंदिरे प्रेक्षणीय आहेत आणि एक भव्य गणपतीची मूर्ती आहे. या मंदिरांपैकी गोंडेश्वराचे मंदिर हे शिवपंचायतन असून, एका प्रशस्त चौथऱ्याच्या मध्यभागी मुख्य मंदिर आहे व त्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या बाजूंना विष्णू, गणेश, पार्वती व सूर्य या देवतांची उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत विभागले असून त्याला तीन द्वारे आहेत. ते गोविंदराज या यादव राजाने बाराव्या शतकात बांधले. मंदिर नागरशैलीत— विशेषतः माळव्यात प्रचलित असणाऱ्या ‘भूमिज’ या उपशैलीत— बांधले आहे. ही शैली मूळ नागर आणि द्राविड यांहून काहीशी भिन्न असून तीत स्थानिक वैशिष्ट्ये डोकावतात. शिखराची घडण आणि मंदिराच्या पायाची आखणी यांत कलाकाराने समतोल साधला आहे. यादवकालीन शिखरांपैकी हे एक उभट पिरॅमिडप्रमाणे आकाशाकडे झेपावणारे सुरेख, भव्य व नमुनेदार शिखर असून छायाप्रकाशाचा समतोल त्यात साधला आहे मात्र शिखराचा वरचा भाग तुटला आहे. स्तंभ व मंडोवरावर काही देवदेवतांच्या मूर्ती आढळतात. शहराच्या वायव्येला ऐश्वरेश्वर मंदिर असून ते चालुक्यशैलीत बांधले असले, तरी त्यांत नागरशैलीत आढळणारे स्तंभशीर्षांचे ज्ञापक सर्वत्र आढळते आणि सांप्रत त्याचे गर्भगृह व काही स्तंभच अवशिष्ट आहेत. स्तंभांवर तुळ्या आहेत. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस स्तंभ आहेत. स्तंभशीर्षावर सिंहाकृती असून मधल्या कंगोऱ्यात अनेक मूर्ती कोरल्या आहेत. त्यात कामशिल्पे आढळतात. भिंतीच्या तळाशीही शिल्पांकन आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर गजलक्ष्मी, शेषशायी विष्णू व सप्तमातृका यांच्या प्रतिमा आहेत. वितानात (छत) अष्टदिक्‌पालांच्या मूर्ती असून द्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांच्या मूर्ती आढळतात, तसेच समोरच्या भिंतीतील स्तंभांवर ब्रह्मा व विष्णू यांच्या सुरेख मूर्ती आहेत. प्राकारातील स्तंभ चौकोनी, षट्‌कोनी व अष्टकोनी असून त्यांवर विष्णूचे अवतार आणि नृत्यांगनांच्या सुंदर मूर्ती आहेत. त्याच्या वास्तुशैलीवरुन तज्ञांच्या मते ते अकराव्या शतकातील असावे.

अलीकडे येथे एक भूविज्ञानविषयक संग्रहालय स्थापन करण्यात आले असून, ते झिओलाइट खनिजासाठी प्रसिद्घ आहे.

संदर्भ : 1. Deshpande, S. R. Yadava Sculpture, Delhi, 2006 (Reprint).

2. Majumdar, R. C. Ed. Struggle for Empire, Bombay, 1998 (Reprint).

निगडे, रेखा

https://vishwakosh.marathi.gov.in/25833/


समृद्ध वारसा हे सिन्नरचे वेगळेपण!


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठलेही शहर समृद्ध होते ते सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समृद्धीच्या समन्वयाने. पेशवेकालीन सिन्नर असेच वेगळेपण जपणारे शहर आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. अंजली वेखंडे यांनी केले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या नाशिक आवृत्तीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी 'मटा हेरिटेज टॉक' या ऑनलाइन व्याख्यानात त्यांनी 'पेशवेकालीन सिन्नर' या विषयावर संवाद साधला. डॉ. वेखंडे म्हणाल्या, की या शहराचे वर्णन सांगणारे अनेक पौराणिक, सातवाहनकालीन, राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांशी निगडित असणारे संदर्भ आहेत. पेशवेकालीन समृद्धीची परंपरा सांगणारेदेखील भरपूर संदर्भ उपलब्ध आहेत. एका ऐतिहासिक संदर्भ जपणाऱ्या बखरीमध्ये सिन्नरचे वर्णण लेखकाने चक्क 'लिटल पुणे' असे केले आहे यावरून या शहराने जपलेल्या निसर्गाची कल्पना यावी. सिन्नरसारख्या शहराने केवळ जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्राचेदेखील प्रतिनिधीत्व केले आहे. ते या अर्थाने, की सातवाहनांच्या काळापासून पेशव्यांच्या कालखंडातही मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि आर्थिक अभिसरणाचा वारसा या भौगोलिक परिसरास लाभला आहे.

डॉ. वेखंडे यांनी पेशवेकालीन अर्थकारणावर प्रकाश टाकताना पेशव्यांच्या कार्यकाळातील महसूल पद्धती, महसुलीय रचना, महसुलाच्या उत्पन्नाचे स्रोत याची तपशीलवार माहिती दिली. त्या काळात सिन्नरच्या कुशीत सर्व समाज आणि धर्म गुण्यागोविंद्याने नांदत होते. वस्त्रोद्योगामध्ये मुस्लिम धर्मीयांचे असणारे योगदान, धातूकाम, काचकाम यामध्ये विशेषत्वाचे बांगड्यांची निर्मिती, खाटिक व्यवसाय, शेती, पानांची शेती आदी व्यवसायांनी या शहराला आर्थिक समृद्धता दिली. त्या काळात सतीसारख्या प्रथादेखील अस्तित्वात असल्याचे संदर्भ त्यांनी सादर केले.

सिन्नरकडे सांस्कृतिक दृष्टीने बघायचे झाल्यास शेजारीच असणाऱ्या नाशिक या तीर्थक्षेत्राचा मोठा प्रभाव या शहरावर पडलेला आढळून येतो, असे त्यांनी सांगितले. श्री गोंदेश्वरापासून अनेक मंदिरांचे अस्तित्व यामुळे या काळात असल्याचे दिसून येते. या शहरात असणाऱ्या मंदिरांवर शैव पंथीयांचाही मोठा प्रभाव असल्याच्या खुणा पेशवेकालीन वाटचालीत पुढे येतात. पेशव्यांच्या राजवटीत धर्म आणि सणोत्सव परंपरांना विशेष महत्त्व असल्याने या शहरावरही मोठा प्रभाव दिसून येतो. यामुळे दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासारखे उत्सव असोत किंवा देवीचे उत्सव असोत मोठ्या उत्साहाने ते येथे साजरे होत असत. याशिवाय मुस्लिम धर्मीयांचे ईद आणि मोहर्रमदेखील उत्साहात साजरे होत असत. या दोन्ही धर्मीयांसाठी खर्चासाठी प्रशासकीय तरतूद त्या काळात होती. याशिवाय भोजन समारंभांवरदेखील मोठा भर या काळात असलेला आढळून येतो.

पौराणिक संदर्भही अभिमानास्पद

सिन्नर शहर समजावून घेताना केवळ पेशवेकाळापर्यंत मर्यादित राहून चालणार नाही, तर त्यासाठी पौराणिक काळात मौनीनाथांच्या चरित्रात या शहराला ब्रह्मपुरी म्हटले आहे. राज्यात सातवाहनांनी जी काही शहरे वसविली त्यापैकी एक सीरीनगर म्हणजे सिन्नर होय. यानंतरच्या काळात राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांचाही प्रभाव या शहरावर राहिला असल्याचे मोलाचे संदर्भ यावेळी डॉ. वेखंडे यांनी दिले.

https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/history-researcher-dr-dr-anjali-venkhade-talks-about-sinnar-in-peshwa-era/articleshow/83717343.cms


सिन्नरचे वैभव ठरतोय महागणपती


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर तालुक्याचे वैभव असलेला महागणपती हा ऐतिहासिक धार्मिक वास्तूपैकी एक मानला जातो. महाराष्ट्रातील दोन नंबरची उंच असलेली व सिमेंट काँक्रिट असलेली भव्य मूर्ती राज्यासह देश विदेशात प्रसिद्ध आहे. हा गणपतीची मूर्ती सिन्नरचे वास्तूशिल्पकार रंगनाथ गंगाराम लोखंडे यांनी स्वखर्चातून १९४७ साली साकारली.

सिन्नरला ऐतिहासिक, धार्मिक स्तळे असल्यामुळे शहराला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. येथील गोंदेश्वर मंदिर हे हेमाडपंथी मंदिरापैकी एक असलेले मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर सिन्नरचा भव्य गणपतीही तितकाच प्रसिद्ध आहे. लाल रंगाने अच्छादलेला भव्य गणेशाला सिन्नरच्या वैभवात महत्वाचे स्थान आहे. सिन्नरचे पेंटर म्हणून प्रसिद्ध असलेले रंगनाथ लोखंडे यांनी ही मूर्ती सिमेंट काँक्रिटमध्ये तयार केली. यासाठी वाळू, दगड, विटा, स्टीलचा वापर करण्यात आला आहे. ही मूर्ती त्यांनी स्वखर्चातून तयार केली. त्यावेळी ही मूर्ती बनवण्यासाठी १३५० रुपये खर्च आला होता. सर्वप्रथम सिमेंटच्या चौकोनी चौथऱ्यावर ही मूर्ती तयार केली. ही मूर्ती अनेक वर्ष उघड्यावर होती. या मूर्तीला ६५ वर्षे होऊनही वातावरणाचा कुठलाही परिणाम झालेला नाही. काही वर्षांपूर्वी या महागणेशावर

आरसीसी शेडचे आच्छादन करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक वातावरणापासून या मूर्तीचे संरक्षण झाले.

या महागणेशाची उंची १७ फूट असून, राज्यात दोन नंबरची भव्य मूर्ती असल्याने सर्वप्रथम एअर इंडियाने हा गणपती आपल्या दिनदर्शिकेवर प्रसिद्ध केला. त्यामुळे या गणपतीला राज्य व देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीमुळे देश विदेशातील पर्यटक सिन्नरला महागणपतीच्या दर्शनासाठी येतात. दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला या गणेशाभोवती फुलांची सजावट करून विद्युत रोषणाई केली जाते. गणेशोत्सवात या ठिकाणी आकर्षक रोषणाई केली जाते.

या महागणपतीच्या परिसरात सिन्नरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे मंदिर असून, बाजूला शनेश्वराचे मंदिर दक्षिणमुखी मारुती व शंकराचे मंदिर आहे काही वर्षापूर्वी सिन्नरकरांनी या मंदिराचे जीर्णोद्धार केल्यामुळे हा परिसर शहराचा ऐतिहासिक, धार्मिक स्थळाची साक्ष देत आहे. सिन्नरच्या वैभवात मानाचा तुरा या मंदिरांनी उभा केला आहे.


सिन्नर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातीलसिन्नर तालुक्याचे

गाव आहे.

येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत

निर्माण करण्यात आली आहे. हे नाशिक

शहराचे एक उपनगर म्हणून उदयास येईल अशी चिन्हे आहेत. मात्र गावात पाण्याचा प्रश्न उग्र आहे.

सिन्नर येथे नगरपालिका असून हे गाव चोहोबाजूंनी भिंती बांधून सीमित केले होते. हे शहर गवळी राजा राजगोविंद याने १२व्या शतकात वसविले आहे.

येथील गोंदेश्वर

व ऐश्वर्येश्वर ही मंदिरे प्राचीन आहेंत.तसेच जवळच देवपुर गावात प्रसिद्ध राणेखान वाडा आहे आणि संत बाबा भागवत महाराज संजीवन समाधी आहे. या मंदिराची व्यवस्था ह.भ.प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत आणि ह.भ.प.धर्माचार्य दिगंबर महाराज भागवत हे पाहतात .(इ.स. २०१६ साली)

वडांगळीची सतीदेवीची यात्रा

2
200

carasole

‘सतीदेवी सामतदादा’ हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत! ते देवस्थान नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात आहे. तेथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या सतीदेवीच्या यात्रेमुळे वडांगळी गावची ओळख महाराष्ट्रभर सर्वदूर पसरली आहे. त्या यात्रेत हजारोंच्या संख्येने दिले जाणारे बोकडबळी आणि त्या विरोधात होणारी आंदोलने यामुळे ती यात्रा दरवर्षी गाजते.

वडांगळी हे गाव सिन्नरपासून पूर्वेकडे बावीस किलोमीटर अंतरावर देवनदीच्या काठावर वसलेले आहे. बाजारपेठेचे गाव असलेल्या, वडांगळीची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास आहे. तेथे पंचक्रोशीतील आठ-दहा गावांची बाजारपेठ भरभराटीला आली आहे. गावाच्या पश्चिमेला सायखेडा रस्त्यालगत सतीदेवी-सामंतदादाचे देखणे मंदिर लक्ष वेधून घेते.

त्या देवस्थानाच्या निर्मितीमागे दंतकथा प्रचलित आहे. सामतदादा हा बंजारा तांड्याचा नायक. त्याच्या मृत्यूनंतर त्याची ब्राह्मण पत्नी लिंबू झेलत तांड्यासोबत निघाली. ज्या ठिकाणी लिंबू जमिनीवर पडेल तेथे सती जाण्याचा तिचा निश्चय होता. तो लिंबू वडांगळी गावाजवळ पडला. त्या ठिकाणी सामतदादासोबत त्यांच्या दोन्ही पत्नी सती गेल्या. तेथे सामंतदादा आणि सतीदेवीची मंदिरे उभारण्यात आली. सतीदेवी मंदिरापुढे दहा फूट अंतरावर सामंतदादाचे छोटेखानी मंदिर आहे. मंदिरात पारंपरिक बंजारा वेशभूषेतील अश्वारूढ मूर्ती आहे. सामतदादा नावाचा गाडीवान सतीदेवी भक्त होता. त्याने सतीदेवीबरोबरच स्वत:ची पत्नी जसमा हिच्यासह वडांगळीत प्राणत्याग केल्याची आणखी एक आख्यायिका प्रचलित आहे.

वडांगळीत १९७० सालापर्यंत केवळ सतीदेवी व सामतदादा यांची दगडी साळुंका असलेली दोन छोटी देवळे होती. गोवर्धन राठोड नावाच्या बंजारा भाविकाने देवीला नवस केला आणि त्याला अपत्यप्राप्ती झाली. त्याने पुत्रप्राप्तीच्या आनंदात मंदिराचा जीर्णोद्धार केला. वडांगळीत सतीदेवी व सामतदादा अशी दोन छोटेखानी सुबक मंदिरे उभी राहिली.

सतीदेवीच्या मंदिरात दगडी चिऱ्यासोबतच सतीदेवीच्या दोन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सामतदादाच्या दोन पत्नींपैकी एक ब्राह्मण तर दुसरी बंजारा जमातीची होती. त्यामुळे त्या मंदिरातील एक मूर्ती ब्राह्मण स्त्रीच्या पारंपरिक वेशात तर दुसरी मूर्ती बंजारा जमातीच्या पेहरावात आहे.

वडांगळीतील प्रभाकर सूर्यकांत म्हाळणकर व शंकरराव सूर्यकांत म्हाळणकर या बंधूंनी सतीदेवीची कथा ओवीबद्ध करून पुस्तक स्वरूपात भाविकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. नवनाथ पोथीतील भर्तृहरी नाथाच्या कथेशी सांगड घालत त्या कथेचे उपकथानक स्वरूपात सतीदेवीची कथा पुढे फुलवत नेली आहे. सतीदेवी संबंधातील लेखी माहिती सर्वप्रथम त्या पुस्तकात प्रकाशित झाली.

मंदिर परिसरात कोरीवकाम असलेले दोन दगडी चिरे आहेत. त्यांचा संदर्भ उपलब्ध नाही. सतीदेवी मंदिरामागे सैंदर नावाचा, त्या भागात सहसा न आढळणारा वृक्ष आहे. सतीदेवीचे मंदिर त्या वृक्षाच्या छायेत उभे आहे. वडांगळी गावात किंवा सिन्नर तालुक्यात बंजारा समाजाची वस्ती नाही. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून बंजारा भाविक वडांगळी गावात दर्शनासाठी येत असतात. पूर्वी माघ पौर्णिमा व चैत्र पौर्णिमा अशी वर्षातून दोन वेळा देवीची यात्रा भरत असे. यात्रा काळात बंजारा समाजाचे बहुसंख्य तांडे ऊस तोडणीसाठी फिरतीवर असत. ते यात्रेसाठी बैलगाड्या जुंपून वडांगळीत दाखल होत. गावात बंजारा भाविकांना लमाण, चारण या नावांनीही संबोधले जाते.

‘सतीयाडी न् सामंतदादा  लो ऽ लो ऽ ऽ लो ऽ ऽ ऽ’ अशी गाणी म्हणत तांड्या तांड्यांनी यात्रेकरूंचे गावात आगमन होत असते. बंजारा समाजाचे भाविक डफ, काशाची थाळी वाजवत देवीची बंजारा भाषेतील गाणी गात, निशाणकाठी मिरवत डेरेदाखल होतात. यात्रेकरू गावात आल्यानंतर सर्वप्रथम सतीदेवीचे दर्शन घेतात. देवीला गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. सतीदेवी नवसाला पावते अशी बंजारा भाविकांची धारणा आहे. नवसपूर्तीसाठी सामतदादाला बोकडबळी देण्‍याची प्रथा आहे.. बळी दिल्‍या जणा-या बोकडाला आधी सामतदादाच्‍या मंदिरात नेले जाते. तेथून बळीसाठी त्‍याचा होकार मिळवला जातो. बक-याने मान हलवणे याला बक-याचा होकार समजतात. त्‍याने मान हलवली नाही तर त्‍यावर पाणी शिंपडून त्‍याला मान हलवण्‍यास भाग पाडले जाते. बोकडबळीला ‘खारा’ नैवेद्य असे म्हणतात. सोबत ‘मद्या’चाही नैवेद्य दाखवला जातो. ऊसतोडणी कामगार असलेल्या अनेक बंजारा भाविकांची वर्षाची पूर्ण कमाई यात्रा काळात प्रवास व बोकडबळीच्या नवसपूर्तीवर खर्च होते. अनेकजण पै-पाहुणे घेऊन स्वतंत्र वाहनाने यात्रास्थळी येतात. ज्यांची आर्थिक कुवत नसते असे चार-पाचजणांचे कुटुंबही बोकडबळी देते. बोकडाच्या मांसाला देवाचा प्रसाद म्हणून मान्यता असल्याने ते फेकून देणे पाप समजले जाते. ज्या कुटुंबाला संपूर्ण बोकड खाणे शक्य होत नाही, ते बोकडाचे मांस खारवून सोबत घेऊन जातात.

सतीदेवी यात्रेत बोकडबळी व मद्याचा नैवेद्य देण्याच्या अनिष्ट प्रथांबरोबरच इतरही काही प्रथा पाळल्या जातात. अनेक बंजारा भाविक यात्रा काळात स्वत:च्या मुलांचे जावळ काढून देवीला मुलांच्या डोक्यावरचे केस अर्पण करतात. त्या प्रथेसाठी गावातील नाभिक समाजातील घरांनी सामंजस्याने प्रत्येक वर्षाच्या पाळ्या वाटून घेतल्या आहेत. गाव व परिसरातील ग्रामस्थ देवीला नवस म्हणून सत्यनारायणाची पूजा घालण्याचे कबूल करतात. त्यानुसार नवसफेडीसाठी यात्रा काळात मंदिर परिसरात सत्यनारायणाची पूजा केली जाते. काही भाविक महिला-पुरुष नवसपूर्तीसाठी गावाच्या वेशीपासून दंडवत किंवा लोटांगण घालत देवीच्या चरणाशी लीन होतात. यात्रेत सौभाग्यलेण्याची प्रथा आढळते. सतीदेवी यात्रेतून विविध बंजारा आभूषणे, उदाहरणार्थ, बांगड्या, चांदीचे गोठ, पाटल्या, चांदीचे झुमके, पायातील पैंजण वगैरे खरेदी करून ती परिधान केल्यास सौभाग्य लाभते अशी समजूत आहे. त्यामुळे अनेक बंजारा महिला यात्रेतून दागिने खरेदी करतात. त्या काळात गावातील सोनाराकडे देवीचे टाक बनवण्यासाठी गर्दी होते. यात्रा काळात देवीला नवीन निशाण (झेंडा) वाहण्याची प्रथा बंजारा भाविकांत आहे. भाविक घरून येताना जुने निशाण घेऊन येतात. यात्रेतून दोन नवीन निशाणे विकत घेऊन जुने निशाण विसर्जित करतात. दोन निशाणांपैकी एक निशाण देवीला वाहून दुसरे घरी घेऊन जातात.

बंजारा समाजाने महाराष्ट्राला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री दिले आहेत. तरीही या समाजात शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक मागासलेपण आहे. विविध रुढी-परंपरा व अंधश्रद्धा यांचा पगडा आहे. त्यामुळे त्यांच्यात बोकडबळी, व्यसनाधीन होण्यासारख्या अनिष्ट प्रथा पूर्वापार काळापासून रूजल्या आहेत. हा समाज ऐपत नसतानाही बोकडबळीची प्रथा पाळताना दिसतो. त्यामुळे त्या समाजात कर्जबाजारी होण्याचे प्रमाण जास्त आहे. आजही तो समाज परंपरा व रूढी यांच्या दुष्टचक्रात अडकला आहे. यात्रा काळात वडांगळी गावात ‘बंजारा दल’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या तालुका व जिल्हा शाखा यांच्यातर्फे तसेच काही शाळांचे विद्यार्थी भाविकांचे अंधश्रद्धा विरोधी जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. अंधश्रद्धेचा निषेध करण्यासाठी लाक्षणिक उपोषण, पत्रके वाटप, प्रचार फेरी, पथनाट्ये असे मार्ग वापरले जातात. पूर्वी यात्रेत बोकडबळी उघड्यावर दिले जात असत. तो प्रकार आता बंद झाला असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदिस्त ‘स्लॉटर हाऊस’मध्ये बोकड कापले जातात.

कापलेल्या बोकडांच्या कातडीला बाजारात चांगला भाव असतो. ते कातडे खरेदी करण्यासाठी लिलाव केला जातो. त्यांची किंमत लाखांच्या पुढे जाते. स्थानिक खाटिकांमध्ये लिलावाची बोली लावण्याची स्पर्धा असते. तो लिलाव म्हणजे वर्षभर देवीसाठी कापल्या जाणाऱ्या बोकडांच्या कातड्यांची खरेदी करण्याचा मक्ता असतो. यात्रेकरूंना योग्य ते पैसे देऊनच कातडे खरेदी करावे लागते. कातडे विक्रीचा निर्णय यात्रेकरूंचा असतो. केवळ चामडे खरेदीचा मक्ता लाखभर रुपयांच्या पुढे जातो. लिलावातून आलेली रक्कम अथवा लिलाव करण्याचा अधिकार पूर्वापार गावकीकडे (गावची गावठी ट्रस्ट) आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून गावातील मंदिरांची देखभाल, यात्रेतील कुस्त्या, टांग्यांच्या शर्यती यांचा खर्च भागवला जातो.

सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी सहपरिवार सतीदेवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री निधीतून दोन लाख रुपयांचा निधी सतीदेवी देवस्थानाच्या विकासासाठी दिला होता. अशोक चव्हाण या कल्पक बंजारा तरुणाने १९८३ मध्ये देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर मंदिर व परिसराच्या विकासाची घोडदौड वेगाने सुरू झाली. त्याने शासन दरबारी सतत पाठपुरावा करून, अनेक उच्चपदस्थ बंजारा भाविकांकडून, आर्थिक पाठबळ मिळवत मंदिर परिसर विकसित केला. पूर्वी केवळ तीन-चार गुंठे जागेवर असलेला तो मंदिर परिसर दहा एकरहून अधिक जागेवर विस्तारला गेला. मंदिर परिसरात भाविकांसाठी ‘भक्तनिवास’, बोकडबळीसाठी ‘स्लॉटर हाऊस’, सभामंडप, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून एका वेळी दहा हजार लोक जमू शकतील असे भव्य सभागृह त्या ठिकाणी उभारण्यात आले आहे.

एका वृत्तपत्राने १९९३ साली सतीदेवी देवस्थानाच्या बोकडबळी प्रथेसंदर्भात बातमी छापली. त्यानंतर माध्यम जगताचे लक्ष त्या यात्रेकडे, तेथील नवसाच्या नावावर होणाऱ्या पशूहत्येकडे वेधले गेले. दरवर्षी यात्रा काळात त्या विषयावर होणाऱ्या आंदोलनांमुळे; तसेच, दूरचित्रवाणी व वृत्तपत्रांतील प्रसिद्धीमुळे यात्रेचे स्वरूप गेल्या पंचवीस वर्षांत कमालीचे व्यापक होत गेले आहे. पूर्वी केवळ काही हजारोंच्या संख्येने येणारे बंजारा भाविक आता लाखोंच्या संख्येने वडांगळीत येतात. चार-पाच हजार लोकसंख्येच्या गावावर, तेथील ग्रामपंचायतीवर यात्रेच्या नियोजनाचा प्रचंड ताण येतो. यात्रा काळात दोन-तीन दिवसांत हजारो वाहनांनी लाखो भाविक गावात येतात. दोन हजारांहून अधिक बोकडांचा बळी दिला जातो. दारूची विक्रमी विक्री होते. यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा काळात परिसरातून वाहणाऱ्या कडवा कालव्याच्या चारीला पाणी पाणी सोडले जाते. त्यामुळे यात्रेकरूंची पाण्याची मोठी गरज भागते. तांड्या तांड्यांवर राहणाऱ्य़ा बंजारा समाजाला प्रतिकुलतेशी झगडण्याचे बाळकडू मिळत असते. त्यामुळे तो समाज यात्रा काळात राहणे, स्नान, प्रातर्विधी आदी अनेक समस्यांची गैरसोय सहन करत मोठ्या संख्येने यात्रेसाठी हजेरी लावतो.

सतीदेवी हे वडांगळी ग्रामस्थांचेही ग्रामदैवत आहे. पूर्वी तेथील शंकर गुरव देवीची पूजाअर्चा करत असत. सध्या त्यांचे वंशज ती जबाबदारी पार पाडतात. देवस्थान ट्रस्टने बंजारा समाजाचे हरीभाऊ राठोड यांची मंदिराच्या देखभालीसाठी व्यवस्था लावली. त्यांचे कुटुंब गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून वडांगळीत स्थायिक झाले आहे. गावात बंजारा समाजाचे ते एकमेव कुटुंब. हरीभाऊंच्या निधनानंतर त्यांची मुले मंदिराची व्यवस्था पाहतात.

सतीदेवीचा यात्रोत्सव हा वडांगळीच्या ग्रामस्थांचा मानबिंदू! गावकरी तो उत्सव दिवाळीसारखा साजरा करतात. गाव तसेच पंचक्रोशीतील कोणीही देवीला बोकडबळी देत नाहीत. गावकरी ‘पुरणाच्या पोळी’चा गोड नैवेद्य देवीला अर्पण करतात. यात्रेच्या निमित्ताने गणगोत, माहेरवाशिणी, पै-पाहुणे, नोकरीनिमित्त बाहेर असलेले चाकरमानी गावाकडे परतात. यात्रेत सामील होतात. यात्रेचा आनंद लुटतात.

वडांगळी गावी यात्रा काळात मोठी उलाढाल होते. बोकडविक्री, दारूविक्री, खाद्यपदार्थ, मिठाई, प्रसाद, नारळ, फुलहार, खेळणी, भांडी, बंजारा पेहराव, बंजारा दागिने-आभुषणे यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात. ती एकूण उलाढाल कोट्यवधी रुपयांची असते. यात्रेच्या दिवशी देवस्थानाच्यावतीने पहाटे देवीची महापूजा करण्यात येते. स्थानिक आमदार, खासदार पुढाऱ्यांना पुजेचा मान देण्यात येतो. सायंकाळी गावातून निशाणकाठीची मिरवणूक निघते. डफांच्या तालावर पन्नास-साठ फूट उंचीची निशाणकाठी गावातून मिरवली जाते. त्यावेळी गणपतबाबा भगत यांच्या अंगात देवीचे वारे संचारते. निशाणकाठीची मिरवणूक देवी मंदिराशी येऊन विसावते. तेथे देवीच्या (वारे) हवेत प्रश्न पाहिले जातात. त्यावेळी देवीचा कौल घेऊन पाऊसपाणी, दुष्काळ, रोगराई यासंबंधीचे भाकीत केले जाते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा फड रंगतो. करमणुकीसाठी लोकनाट्य, तमाशा असतो. तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेची उत्साहात सांगता होते.

– किरण भावसार

https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D/


महानुभाव पंथाच्या सिन्नरमधील खुणा | थिंक महाराष्ट्र

See author's posts

carasole

भगवान श्रीचक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ स्थापन केला. महानुभाव पंथ महाराष्ट्रात एक हजार वर्षांपूर्वी उगम पावला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. महानुभाव पंथ श्रीदत्तात्रेय प्रभू यांच्यापासून म्हणजे कृतयुगापासून चालत आलेला आहे असे मानतात. भगवान श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेयप्रभु यांच्यापासून ज्ञानशक्ती स्वीकार केलेले चक्रपाणी महाराज शके १०४३ (इ.स. ११२१), श्रीगोविंदप्रभु शके ११०९ (इ.स. ११८७) व श्रीचक्रधरस्वामी शके ११४२ (इ.स. १२२०) अशी अवतार परंपरा आहे. त्यांना ‘पंचकृष्ण’ असे म्हणतात. त्या पंचकृष्णांचा निवास जेथे झाला, ते आसनस्थ जेथे झाले त्या जागांस ‘स्थान’ असे म्हणतात. ती स्थाने पवित्र मानली गेली आहेत. लोकांनी तेथे महानुभाव पंथातील मंदिरे बांधली आहेत.

श्रीचक्रधर स्वामींचा उपदेश, त्यांचे विचार सातशे वर्षापूर्वीच्या बोलीभाषेत लिहिलेल्या एका ग्रथांत आहेत. त्या ग्रंथाला ‘लिळाचरित्र’ असे संबोधतात. सत्य, अहिंसा, समता आणि ममता यांची दिव्य शिकवण देणारे महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान श्रीचक्रधर स्वामी यांचे मराठी भाषेवरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांचे पशुपक्ष्यांवर, प्राण्यांवर प्रेम होते. त्यांनी महाराष्ट्रभर पायी प्रवास करून गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर असलेल्या गावांना भेटी दिल्या. ते वेगवेगळ्या खेड्यापाड्यांत गेले. तेथील गरीब, साध्याभोळ्या स्त्री-पुरूषांमध्ये मिसळले;  त्यांच्या सुखदुखाशी समरस झाले.

भगवान श्रीचक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील. हरिपाल देव हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म शके १११६ ( इ.स. ११९४ ) मध्ये झाला. ते गुजरातमधील भरूच येथील विशालदेव प्रधान यांचे पुत्र, मालनदेवी हे त्यांच्या आईचे नाव. हरिपाल देव हा राजकुमार बालवयापासून शूर, धाडसी होता. महाराष्ट्रातील सिंघणदेव या यादवराजाने जेव्हा गुजरातवर स्वारी केली तेव्हा त्या युद्धात हरिपाल देवाने भाग घेतला होता. त्याने राज्यकारभारात प्राविण्य संपादन केले होते. त्यांनी श्रीगोविंदप्रभू यांच्याकडून ज्ञानशक्तीचा,जीवोद्धरण शक्तीचा स्वीकार केला व एकांतवास सुरू केला. ते सालबर्डी (ता. मोर्शी) च्या घनदाट जंगलात बारा वर्षें राहिले. त्यांनी राजा भर्तृहरीची भावजय मुक्ताबाई हिची पूजा स्वीकारली. त्यामुळे त्यांचे शरीर सदैव तरूण व तजेलदार दिसे. नंतर ते गोंडमध्ये गेले. त्यांनी आंध्रप्रदेश व कर्नाटक प्रांतांतही संचार केला.

स्वामींचे विचार अभिनव होते. त्यांनी म्हटले, ‘परमेश्वर व जीव हे परस्परांपासून भिन्न आहेत. परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ असून, जीवाचा उद्धार करणारा आहे. यासाठी जीवाने अनन्यभावाने परमेश्वराची भक्ती करावी. त्यासाठी यज्ञयाग आदी कर्मकांडाची आवश्यकता नाही.’ स्वामी हे जरी परमेश्वराचे अवतार होते तरी ते त्यांच्या संचारकाळात जनसामन्यांमध्ये मिसळले  त्यांच्या सुखदु:खाशी एकरूप झाले -त्यांची काळजी वाहिली. ते सर्वांचे हितकर्ता झाले. त्यांनी मराठी आणि महाराष्ट्र यावर प्रेम केले. त्यांनी मनुष्याप्रमाणे प्राणिमात्रांची काळजी घेतली.

चक्रधरस्वामींमुळेच महानुभाव पंथातील लोकांनी चार हजारपर्यंतची ग्रंथनिर्मिती केली. व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, हे तत्त्व महानुभाव पंथात आहे. त्या पंथांची श्रद्धा वैदिक धर्मावर नसली तरी महानुभाव पंथीयांना वैदिक धर्माबद्दल आस्था आहे. महानुभावांचा चातुर्वर्ण्यावर एक सामाजिक गरज म्हणून विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख काही नियम म्हणजे प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत.

महानुभाव पंथाची काही चरणांकित तीर्थस्थाने नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातही आहे. महानुभाव पंथाच्या ‘पंचकृष्णां’पैकी चक्रधर स्वामी यांचा चरणस्पर्श सिन्नर तालुक्यात चौदा चौकाचा वाडा, भोजनतळ, पट्टीशाळा, गोंदेश्वर मंदिर, महानुभाव मंदिर (खोपडी) या स्थानी झाला. तेथे त्यांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. खोपडी येथील महानुभाव मंदिरात चक्रधर स्वामींचा काल्पनिक चेहरा बनवला गेला आहे. तो चेहरा चौथऱ्याजवळच आहे. तेथे चैत्र पौर्णिमेच्या वेळी तीन दिवस जत्रा असते. तीन दिवसांच्या त्या जत्रेत त्या पुतळ्याची देऊळ गाडीवरून जवळच्या गावांत मिरवणूक काढली जाते. मंदिरात जे भाविक दर्शनासाठी येतात ते स्वामींच्या चरणी विडा अर्पण करतात. त्या विड्यात दान, सुपारी आणि नारळ या वस्तू असतात. महानुभाव पंथातील लोकांना मांसाहार व कोठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास मनाई आहे.

– शैलेश पाटील

(‘थिंक महाराष्‍ट्र’कडून महानुभाव पंथाच्‍या सिन्‍नर तालुक्‍यातील खुणांचा आणखी शोध घेतला जात आहे. अधिक माहिती उपलब्‍ध होताच ती लेखात समाविष्‍ट करण्‍यात येईल.)

About Post Author

शैलेश दिनकर पाटील

शैलेश पाटील हे कल्‍याणचे राहणारे. ते एम.एस.इ.बी.मध्‍ये कार्यरत आहेत. ते हौसेने लेखन करतात. त्‍यांचा ओढा भवतालच्‍या सांस्‍कृतिक गोष्‍टींकडे आहे. ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या ‘नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध’ या मोहिमेच्‍या निमित्‍ताने ते ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या वर्तुळात आले आणि संस्‍थेचे कार्यकर्ते बनून गेले.
लेखकाचा दूरध्वनी
96735 73148

जावयाची गाढवावरून धिंड | थिंक महाराष्ट्र

See author's posts

carasole

नाशिकच्‍या वडांगळी गावची अजब प्रथा

नाशिकच्‍या सिन्‍नर तालुक्‍यातील वडांगळी गावात धुलीवंदन ते रंगपंचमी अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून धिंड काढण्‍याची अजब परंपरा पाळली जाते. त्‍यामुळे ज्या गावात लग्नावेळी मोठ्या सन्मानाने वाजत गाजत घोड्यावरून मिरवले गेले तेथेच गाढवावरून धिंड काढली जाण्याची वेळ वडांगळीच्या जावयांवर येते.

वडांगळी गावची ती जगावेगळी प्रथा नेमकी कधी सुरू झाली ते निश्चित सांगता येत नाही. मात्र तिला शंभर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असल्‍याचे गावकरी सांगतात. इंग्रज आमदानीत एका इंग्रज मामलेदाराची वडांगळीच्‍या गावक-यांनी गोड बोलून गाढवावरून धिंड काढल्याची आठवण गावचे पूर्वज सांगत असत. प्रसिद्ध तमासगीर तुकाराम खेडकर यांचा तमाशा वडांगळी मुक्कामी असताना त्यांचीही या प्रथेमध्ये गाढवावरच्या धिंडीसाठी वर्णी लागली होती. गेल्‍या शंभर वर्षांच्या काळात कधी कधी ती प्रथा खंडीतही झाली, मात्र त्या त्या काळातील तरुणाईने तितक्याच उत्साहाने ती पुन्हा सुरूही केली.

धुलीवंदन ते रंगपंचमी या पाच दिवसांत गावातील घरजावई, गावजावई अथवा गावकरी ज्यांना जावयाच्या नात्याने वागवतात अशा व्यक्तींचा धिंडीसाठी प्राधान्याने विचार केला जातो. नोकरीधंद्यानिमित्त गावात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या व्यापारी, नोकरदार व्यक्तींशी गावक-यांकडून जावयाचे नाते लावले जाते. त्यांच्या बायकांना मुलीचा दर्जा दिला जातो. त्‍यांच्‍याशी गावातील तरुण मंडळींचे मेहुण्यांचे चेष्टेचे नाते निर्माण होते. दाजी दाजी म्हणत बहिणीच्या नव-याचा वर्षभर मान राखायचा, मात्र शिमग्याला वर्षभराचे उट्टे काढत त्याची गाढवावरून धिंड काढायची अशी ही मजेशीर प्रथा आहे.

जावयाला धिंडीसाठी राजी करणे हे दिव्यच असते. कोणी जावई राजीखुशीने स्वत:ची धिंड काढून घ्यायला तयार नसतोच. मग गावातील तरूण मंडळीकडून जावयांवर साम, दाम, दंड, भेद, इमोशनल ब्लॅकमेलिंग अशी सर्व आयुधे वापरली जातात. त्‍यसाठी गुप्त मसलती, खलबते केली जातात. अनेक जावई होळी-रंगपंचमीच्‍या काळात गावाबाहेर निघून जातात. पण कोणी ना कोणी खिलाडूवृत्तीचा जावई सापडतोच! ज्याला गावात मान आहे, प्रतिष्ठा आहे अशा सुस्वभावी, मनमिळावू व्यक्तीला प्रथेसाठी प्राधान्य दिले जाते. ग्रामस्थांच्या दृष्टीनेही असा जावई म्हणजे टप्प्यातील सावज असते. किरकोळ आढेवेढे घेत, प्रसंगी “रेमंडचे कपडे घ्याल तर बसतो गाढवावर.” अशी मागणी करत तयार होणारे जावईही भेटतात. जावयाची मनधरणी करणा-या व्‍यक्‍तीकडेच बहुतेक वेळा प्रथेचे यजमानपद येते. मग धिंडीसाठी लागणारा खर्च, त्यानंतर जावयाला करायचा पंचवस्त्रांचा पोशाख याचा खर्च यजमानाला करावा लागतो आणि मग सुरू होते धिंड!

शिमग्याच्या दिवशी वडांगळी गावात वीरांची मिरवणूक पार पडते. गावात घरोघरी वीरांची तळी भरली गेली, की धुळवड सुरू होते. होळीतील राख पाण्यात कालवून धूळमातीची धूळवड खेळली जाते. पण वडांगळीकरांच्या धुळवडीला खरा रंग चढतो तो जावयाच्या गाढवावरील धिंडीने!

मनधरणी, मिनतवा-या करून तयार झालेला जावई गाढवावर बसवला जातो. त्याच्या अंगावरील कपडे फाडले जातात. गळ्यात कांद्यांचा, फाटक्या खेटरांचा हार घातला जातो. काही फाटक्या टायरचेही हार असतात. डोक्‍याला लसणाच्या मुंडावळ्या आणि फाटक्या सुपाचे बाशिंग बांधले जाते. मग यजमानाच्‍या घरापासून ती जगावेगळी मिरवणूक सुरू होते. होळीतील राख, रंग, गाळ, चिखल, माती यांची मनसोक्त उधळण करत गावातील एकेका गल्लीतून जावई गाढवावरून मिरवला जातो. जावई हा सासरेबुवांच्‍या कुंडलीतील ‘दशमग्रह’ समजला जातो. म्‍हणूनच जावयाची धिंड म्हटल्यावर मिरवणूकीत चांगलाच जोष संचारतो. बोंबला रे बोंबला बों ऽ बों ऽ बों ऽ ऽ म्हणत जावयाचे विविधांगांनी गुणवर्णन करत बोंबा मारल्या जातात. अनेक घरांपुढे खास धिंड थांबवून कांद्यांच्या, चपलांच्या माळा जावईबुवांच्या गळ्यात अडकवल्या जातात.

प्रथेचा उल्‍लेख ‘गाढवावरून धिंड’ असा केला जात असला तरी धिंडीसाठी गाढवीण वापरली जाते. त्‍या गाढविणीला धिंडीत नवरी संबोधले जाते. (लग्न लावले जात नाही हे नशीब!) करवले म्हणून गावातील सर्व तरुण मेहुणे हजर असतात. सोबतीला शिमग्याच्या बोंबांची मंगलाष्टकेही असतातच. असा जोरदार शिमगा करून यजमानाच्या दाराशी धिंड संपते.

त्‍यानंतर गल्लीतील चार घरच्या सुवासिनी एकत्र येऊन जावयाला सुगंधी उटणे लावून अंघोळ घालतात. त्यानंतर यजमानाकडून जावयाला पंचवस्त्रे देण्‍यात येतात. गावच्‍या प्रथेचा मान राखल्याबद्दल यजमान व ग्रामस्थ जावयाचे आभार मानतात. त्यानंतर जावई नवीन वस्त्रे परीधान करून ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्वीकारत गावातील प्रमुख रस्त्यावरून फेरी मारतो. त्यानंतर धिंडीचा कार्यक्रम संपतो.

जावयाची गाढवावरून धिंड निघाली, की गावावरचे दुष्काळाचे सावट दूर होते. पाणीपाऊस चांगला होतो. रोगराई टळते, गावाची भरभराट होते अशी गावक-यांची धारणा आहे. त्‍यामुळे जावयाला गावाच्या भल्यासाठी जावयाला गाढवावर बसण्याची गळ घातली जाते.

या प्रथेमुळे जावयाच्‍या ठायी असलेला ताठा, अहंकार गळून पडतो असे मानले जाते. तसेच, जावई वर्गासाठी ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत बनण्याची ती मोठी संधीच! या प्रथेच्‍या नि‍मित्‍ताने वडांगळी गावच्‍या जावयांना त्‍यांच्‍या खिलाडूवृत्तीचे जगाला दर्शन घडवता येते.

लग्नाची मिरवणूक अन् धिंड यांची तुलना होतेच! दोन्हीत मात्र कमालीचा विरोधाभास! लग्नात घोडा असतो. या मिरवणुकीत गाढवाला मान, लग्नात जावयाला नवे कपडे, नवे बुट तर येथे असलेले कपडे फाडून लक्तरे मिरवत मिरवणूक काढली जाते. लग्नात कोरे बुट असतात तर या धिंडीत गळ्यात फाटक्या खेटरांचा हार असतो. मोत्यांच्या मुंडावळ्यांऐवजी लसणाच्या मुंडावळ्या अन् फुलांच्या हारांऐवजी कांद्याचे हार, अंगाला हळद लावण्याऐवजी चिखलमातीचा लेप लावला जातो. लग्नात शुभेच्छा दिल्या जातात तर येथे मात्र बोंबला रे म्हणत बों ऽ बों ऽ बों ऽ ऽ म्हणत तोंडावर आडवा हात मारत शिमगा केला जातो. चिखलमातीच्या रंगांच्या अक्षता उधळीत धिंडीत चांगलेच उट्टे काढले जाते.

धुळवड ते रंगपंचमी या पाच दिवसांत कधीही ती धिंड निघते. पाडव्याला जर जावई सापडला नाही तर किमान रंगपंचमीपर्यंत त्याची शोधमोहीम सुरू राहते. कधी कधी हा ‘जावईशोध’ रंगपंचमीला संपतो. अखेरच्या दिवसापर्यंत जावईशोध घेतल्यानंतर तो रंगपंचमीच्‍या दिवशी मिळाला तर प्रथेतील रंगत आणखी वाढते. जोपर्यंत जावई भेटत नाही तोपर्यंत, यंदा प्रथेत खंड पडतो की काय अशी धाकधूक सगळ्यांनाच असते.

आता आतापर्यंत वडांगळीतील हरहुन्नरी नाट्यकलावंत शिवाजी गोरे यांचा त्‍या प्रथेच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण सहभाग असे. त्यांचा स्वत:चा कुंभाराचा व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे स्वत:ची गाढवे होती. जावयाच्या धिंडीसाठी पोटाचा मोठा घेर असलेली ‘हरणी’ नावाची गाढवीण ते वापरत असत. ती गाढवीण चांगल्या भरभक्कम वजनाच्या जावयाचा बोजाही सहज पेलू शकत असे. धुळवडीतील गोंगाट, चिखलफेक व वाजंत्री यांचा तिच्यावर परिणाम होत नसे. त्यामुळे धिंड जोरात व्हायची. आता ‘हरणी’ गाढवीण नाही. तिचा मालक शिवाजी गोरेही नाही. त्यामुळे त्या प्रथेच्या मार्गात अनेक अडचणी उभी राहिली आहेत. बदलत्या काळात गावात गाढव मिळणे दुरापास्त झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून बाहेरगावाहून गाढव भाड्याने आणून हौशी ग्रामस्थ धिंडीची प्रथा पार पाडत आहेत. सिन्नर, सायरवेडा अशा ठिकाणाहून गाढव स्पेशल गाडी करून भाड्याने आणण्याची कसरत करावी लागते. त्यामुळे यजमानाला ‘जावयाच्या मानपानाचा खर्च परवडला पण गाढवाचा नको’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

असे असले तरी वडांगळी गावात धुळवडीच्या दिवशी न चुकता रंगांच्या अक्षता उधळत जावयाचे गाढवावरुन धिंडवडे निघतात. पण ते सारे परंपरेच्या आनंदासाठीच!

– किरण भावसार

https://www.maayboli.com/node/25294

गारगोटी संग्रहालय 

नाशिक जवळील सिन्नर येथिल गारगोटी संग्रहालयाला भेट देण्याचा योग आला.............तेथिल काही प्रकाशचित्रे !!
हे वेगवेगळ्या रंगीबेरंगी खनिज पदार्थांचे छान संग्रहालय आहे !
याबद्दल माहीती इंटरनेटवर उपलब्ध आहे..............
P1000516_0.JPGP1000385.JPGP1000391.JPGP1000402.JPGP1000403.JPGP1000407.JPGP1000408.JPGP1000412.JPGP1000418.JPGP1000424.JPGP1000428.JPGP1000441.JPGP1000448.JPGP1000454_0.JPGP1000459_0.JPGP1000484_0.JPGP1000485_0.JPGP1000486_0.JPGP1000493_0.JPGP1000494_0.JPGP1000504_0.JPGकाही जीवाश्म......

P1000466_0.JPGP1000469_0.JPG

गुल

Gargoti Museum, Sinnar, Nasik -

Adwait Karajagi

स्कोलेसाइट गार्गोटी
स्कोलेसाइट गार्गोटी

हेलो साथी साहसी! यदि आप कभी भी भारत के महाराष्ट्र के नासिक क्षेत्र में हों, तो आपको निश्चित रूप से खनिज संग्रहालय गार्गोटी को देखना होगा। यह खनिज के शौकीनों के लिए एक कैंडी स्टोर की तरह है, लेकिन इसमें बहुत अधिक चट्टानें और बहुत कम दंत छिद्र हैं।

सिन्नर, नासिक के एमआईडीसी क्षेत्र में स्थित, गार्गोटी दुनिया में भारतीय जिओलाइट्स और खनिजों के सबसे बड़े संग्रह में से एक है। और मैं आपको बता दूं, ये चट्टानें सचमुच प्रभावशाली हैं। वे सभी प्रकार के रंगों और आकारों में आते हैं, और वे बस इंस्टाग्राम पर आने की भीख मांग रहे हैं।

लेकिन गार्गोटी की सबसे अच्छी बात सिर्फ खनिजों का अद्भुत संग्रह नहीं है। यह तथ्य है कि संग्रहालय की स्थापना एक सच्चे दूरदर्शी कृष्ण चंद्र पांडे ने की थी। इस व्यक्ति ने अपना जीवन भारतीय खनिजों और जिओलाइट्स को वह पहचान दिलाने के लिए समर्पित कर दिया जिसके वे हकदार थे, और क्या वह सफल हुआ।

जिओलाइट्स की विस्तृत श्रृंखला
जिओलाइट्स की विस्तृत श्रृंखला

गार्गोटी: जिओलाइट खनिज और क्रिस्टल कैसे बनते हैं?

तो, ये सुंदरियाँ कैसे बनती हैं? खैर, यह सब गहरे भूमिगत से शुरू होता है, जहां खनिज और ज्वालामुखीय चट्टानें आपस में मिलती हैं और एक-दूसरे के साथ सहज हो जाती हैं। यह एक विशाल खनिज पार्टी की तरह है, और इसमें सभी को आमंत्रित किया गया है!

जिओलाइट खनिज और क्रिस्टल क्रिस्टलीकरण नामक प्रक्रिया के माध्यम से बनते हैं। ऐसा तब होता है जब कुछ खनिज पानी में घुल जाते हैं और फिर पानी के वाष्पित होने या तापमान में परिवर्तन होने पर एक ठोस क्रिस्टल संरचना में बदल जाते हैं।

विशेष रूप से, जिओलाइट्स ज्वालामुखी की राख या तलछटी चट्टान से बनते हैं जिनमें उच्च मात्रा में एल्यूमीनियम और सिलिकॉन होते हैं। समय के साथ, ये सामग्रियां टूट जाती हैं और पानी के साथ मिल जाती हैं, जिससे एक जेल जैसा पदार्थ बनता है जो बाद में कुछ शर्तों के तहत जिओलाइट्स में क्रिस्टलीकृत हो सकता है। समय के साथ, खनिज क्रिस्टलीकृत होने लगते हैं और इन भव्य संरचनाओं का निर्माण करते हैं जिन्हें हम जिओलाइट्स कहते हैं। यह ऐसा है जैसे वे अपने स्वयं के छोटे क्रिस्टल महल बना रहे हैं, जो बुर्ज और खाई (ठीक है, शायद खाई नहीं) से परिपूर्ण हैं।

और लोगों की तरह, ये क्रिस्टल भी अलग-अलग आकार, साइज़ और रंगों में आते हैं। कुछ हल्के गुलाबी रंग के हैं, कुछ चमकीले हरे रंग के हैं, और कुछ नारंगी रंग के खूबसूरत हैं, जिन्हें देखकर आप उन्हें चाटना चाहेंगे (लेकिन ऐसा न करें, यह सुरक्षित नहीं है)।

जिओलाइट्स की अनूठी संरचना उनके छोटे छिद्रों और चैनलों की उच्च सांद्रता के कारण होती है जो अन्य अणुओं को फंसा और छोड़ सकते हैं। यह गुण जिओलाइट्स को विभिन्न प्रकार के अनुप्रयोगों में उपयोगी बनाता है, जैसे जल निस्पंदन, गैस शुद्धिकरण और यहां तक ​​कि रासायनिक प्रतिक्रियाओं में उत्प्रेरक के रूप में भी।

गार्गोटी क्लोज़ अप
गार्गोटी क्लोज़ अप

दक्कन के पठार में गर्गोटिस:

दक्कन का पठार एक बड़ा ज्वालामुखीय प्रांत है जिसका निर्माण लगभग 65 मिलियन वर्ष पहले क्रेटेशियस काल के अंत में हुआ था। यह विशेष रूप से महाराष्ट्र के पुणे क्षेत्र में जिओलाइट खनिजों के व्यापक भंडार के लिए जाना जाता है। ऐसा माना जाता है कि दक्कन के पठार में इन जिओलाइट्स का निर्माण लाखों साल पहले इस क्षेत्र में हुई ज्वालामुखीय गतिविधि से संबंधित है।

डेक्कन ट्रैप्स के दौरान ज्वालामुखी विस्फोट, लावा प्रवाह और राख जमाव ने क्षेत्र के बड़े हिस्से को कवर कर लिया। जैसे ही ज्वालामुखी की राख और लावा ठंडा और ठोस हुआ, उन्होंने बेसाल्ट और टफ सहित विभिन्न प्रकार की चट्टानों का निर्माण किया। इन चट्टानों की रासायनिक संरचना ने, पानी की उपस्थिति के साथ, जिओलाइट्स के निर्माण के लिए अनुकूल परिस्थितियाँ बनाईं।

समय के साथ, ज्वालामुखीय चट्टानों में मौजूद खनिजों ने भूजल के साथ प्रतिक्रिया की, जो घुले हुए सिलिका और एल्यूमीनियम आयनों को ले गया। ये आयन मिलकर एक जेल जैसा पदार्थ बनाते हैं जो धीरे-धीरे क्रिस्टलीकृत होता है, जिससे जिओलाइट्स के विशिष्ट छिद्र और चैनल बनते हैं।

दक्कन के पठार में पाए जाने वाले विशिष्ट प्रकार के जिओलाइट ज्वालामुखी गतिविधि की सटीक स्थितियों, जैसे तापमान और दबाव, साथ ही आसपास की चट्टानों और खनिजों की संरचना पर निर्भर हैं। दक्कन के पठार में पाए जाने वाले कुछ जिओलाइट्स में स्टिलबाइट, ह्यूलैंडाइट, चबाज़ाइट और क्लिनोप्टिलोलाइट शामिल हैं।

कुल मिलाकर, दक्कन के पठार में ज्वालामुखीय गतिविधि ने आज इस क्षेत्र में पाए जाने वाले जिओलाइट भंडार के निर्माण में महत्वपूर्ण भूमिका निभाई।

खजाने से भरे रैक
खजाने से भरे रैक

इन क्रिस्टलों में अलग-अलग रंग कैसे होते हैं?

जिओलाइट्स में विभिन्न रंग आमतौर पर अशुद्धियों की उपस्थिति या उनकी रासायनिक संरचना में भिन्नता के कारण होते हैं।

उदाहरण के लिए, कुछ जिओलाइट्स, जैसे एपोफ़िलाइट, में हरा रंग लोहे या अन्य ट्रेस तत्वों की उपस्थिति के कारण होता है। स्टिलबाइट में गुलाबी रंग मैंगनीज की उपस्थिति के कारण होता है। अन्य रंग, जैसे कि सफेद, पीला और नारंगी, विभिन्न प्रकार के कारकों के कारण हो सकते हैं, जिनमें विभिन्न धातुओं की उपस्थिति, पानी की मात्रा, या यहां तक ​​कि क्रिस्टल संरचना में भिन्नता भी शामिल है।

यह ध्यान रखना महत्वपूर्ण है कि जिओलाइट का रंग प्रकाश की स्थिति के आधार पर भी भिन्न हो सकता है जिसके तहत इसे देखा जाता है। प्राकृतिक धूप में या कृत्रिम प्रकाश में, जिओलाइट का रंग अन्य प्रकाश स्रोतों या प्राकृतिक छाया में देखने से भिन्न दिखाई दे सकता है।

कुल मिलाकर, जिओलाइट्स का रंग उनकी संरचना के बारे में सुराग प्रदान कर सकता है और इन खनिजों की पहचान और वर्गीकरण में उपयोगी हो सकता है।

अर्केनस्टोन, पहाड़ का हृदय
अर्केनस्टोन, पहाड़ का हृदय

गार्गोटी संग्रहालय के पीछे का आदमी

केसी पांडे
केसी पांडे

 भारतीय नौसेना में शामिल होने और नौसेना इंजीनियर (वैमानिकी) के रूप में प्रशिक्षण के बाद, केसी पांडे को महाराष्ट्र में तैनात किया गया था। यहीं पर उन्होंने अपने नौसैनिक अड्डों के पास खदानों से जिओलाइट्स और खनिजों को इकट्ठा करना शुरू किया। 1993 में जब केसी पांडे नौसेना से सेवानिवृत्त हुए, तो उन्होंने अपने शौक को पूर्णकालिक व्यवसाय में बदल दिया। उन्होंने सुपर्ब मिनरल्स इंडिया की शुरुआत की, जो दुनिया में भारतीय जिओलाइट्स और खनिजों का सबसे बड़ा डीलर और निर्यातक बन गया।

केसी पांडे की सफलता यहीं नहीं रुकी। उन्होंने नासिक में भारत का पहला और एकमात्र रत्न और खनिज संग्रहालय भी खोला, जिसे "गार्गोटी, द मिनरल म्यूज़ियम" कहा जाता है। उन्होंने संग्रहालय को "भारत माता" को समर्पित किया और यह भारत में पाए जाने वाले कुछ सबसे आश्चर्यजनक खनिजों और जिओलाइट्स को प्रदर्शित करता है।

तो अगली बार जब आप किसी खूबसूरत भारतीय खनिज या जिओलाइट की प्रशंसा करें, तो गारगोटी के पीछे के व्यक्ति को याद करें जिसने इन खजानों को दुनिया के सामने लाने में मदद की।

एक ऐसे व्यक्ति के रूप में जो प्राचीन चट्टानों को काटकर बनाए गए मंदिरों का अध्ययन करता है, मैं विशेष रूप से गारगोटी में प्रदर्शित प्राचीन खनिजों से आकर्षित हुआ था। ये क्रिस्टल हजारों वर्षों से मौजूद हैं, और इनका उपयोग पारंपरिक दवाओं से लेकर वास्तुशिल्प उत्कृष्ट कृतियों तक हर चीज में किया जाता रहा है।

और वास्तुकला की उत्कृष्ट कृतियों की बात करें तो संग्रहालय स्वयं कला का एक नमूना है। यह जटिल नक्काशी और आश्चर्यजनक डिजाइनों से भरा हुआ है जो आपकी सांसें रोक देगा। यह एक अलग दुनिया में कदम रखने जैसा है, जहां खनिजों का वर्चस्व है, और हर चीज बस थोड़ी सी चमकदार है।

इसलिए यदि आप कभी नासिक क्षेत्र में हों, तो खनिज संग्रहालय, गारगोटी को अवश्य देखें। यह एक ऐसा अनुभव है जिसे आप नहीं भूलेंगे, और कौन जानता है, आप चट्टानों और खनिजों के लिए एक नई सराहना के साथ जा सकते हैं। अरे अजनबी, बातें हो गईं!

फ़ूल्स गोल्ड
फ़ूल्स गोल्ड
ब्राज़ील से गार्गोटी
ब्राज़ील से गार्गोटी
ब्राज़ील से गार्गोटी
ब्राज़ील से गार्गोटी
भव्य गार्गोटी
भव्य गार्गोटी

गार्गोटी संग्रहालय तक कैसे पहुंचें:

🚙 कार से: गारगोटी संग्रहालय पुणे से लगभग 190 किमी, मुंबई से 180 किमी और नासिक शहर से लगभग 25 किमी दूर है। 
🚂 ट्रेन से: गारगोटी संग्रहालय के लिए निकटतम रेलवे स्टेशन नासिक या नासिक रोड है, जो लगभग 25 किमी दूर है और भारत के सभी कोनों से अच्छा यातायात है।
🚌 बस से: नासिक के लिए मुंबई और पुणे से हर आधे घंटे में बसें चलती हैं। नासिक के लिए सार्वजनिक और निजी दोनों बसें उपलब्ध हैं। चूँकि गारगोटी संग्रहालय सिन्नर शहर के बाहर है, कोई भी सिन्नर एमआईडीसी पर पुणे नासिक राजमार्ग पर उतर सकता है और रिक्शा ले सकता है या संग्रहालय तक लगभग 2 किमी पैदल चल सकता है।  
🚀 हवाई मार्ग से: नाइक के पास शहर से लगभग 20 किमी उत्तर में एक हवाई अड्डा है, जो इसे गारगोटी संग्रहालय का निकटतम हवाई अड्डा बनाता है।
🎟️ टिकट: गारगोटी संग्रहालय में 100 रुपये का टिकट है, जिसमें गाइड शुल्क शामिल है। यदि आप किसी बड़े समूह के साथ जा सकें तो बेहतर होगा।
🛏️ ठहरने के स्थान: सिन्नार में खाने के लिए कुछ अच्छे होटल हैं और जो आवास प्रदान करते हैं। यदि आप अधिक होटल विकल्पों की तलाश में हैं तो नासिक सबसे अच्छा विकल्प होगा। 🛕सिनार शहर में गोंडेश्वर मंदिर का दौरा करना न भूलें, क्योंकि यह एक प्राचीन वास्तुकला चमत्कार है।

ये गारगोटी तो नहीं है?
ये गारगोटी तो नहीं है?
गार्गोटी, पुणे में निर्मित
गार्गोटी, पुणे में निर्मित
गार्गोटी कैसे खोली जाती है?
गार्गोटी कैसे खोली जाती है?
क्या वह क्रिप्टोनाइट बायीं ओर है?
क्या वह क्रिप्टोनाइट बायीं ओर है?
स्कोलेसाइट गार्गोटी नासिक में पाई जाती है
स्कोलेसाइट गार्गोटी नासिक में पाई जाती है
विशाल दांत
विशाल दांत
पीओपी भारत माता
पीओपी भारत माता
गुलाबी क्वार्ट्ज गणेश
गुलाबी क्वार्ट्ज गणेश            

https://drifteradwait-com.translate.goog/gargoti-museum/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc


गारगोटी संग्रहालय, सिन्नर (नासिक)

गारगोटी संग्रहालय, सिन्नरनासिक से 32 किलोमीटर दूर नासिक-शिरडी राजमार्ग पर स्थित एक छोटा सा हलचल भरा शहर सिन्नर है, जो गार्गोटी संग्रहालय नामक पुरस्कार विजेता खनिज संग्रहालय के लिए प्रसिद्ध है। गार्गोटी संग्रहालय में, सभी आगंतुकों के स्वागत के लिए प्रवेश द्वार पर भारत माता की एक विशाल प्रतिमा लगाई गई है। मूर्ति के ठीक ऊपर बड़े गुंबद पर एक नक्शा लगाया गया है जो बदलते भारतीय उपमहाद्वीप को दर्शाता है। संग्रहालय के भूतल पर, लगभग 1700 जिओलाइट्स का संग्रह है जो हीरे या अन्य कीमती पत्थरों के समान अच्छी तरह से परिभाषित समृद्ध संरचनाओं के साथ सूक्ष्म छिद्रपूर्ण क्रिस्टलीय ठोस हैं। इनका उपयोग जल मृदुकरण और शुद्धिकरण, कृषि में किया जाता है। प्रत्येक जिओलाइट का रंग और आकार बहुत अनोखा होता है, जिससे सकारात्मक ऊर्जा निकलती है।गारगोटी संग्रहालय, सिन्नरआपको दुनिया के विभिन्न हिस्सों से कुछ बहुत ही चुनिंदा रचनाएँ देखने को मिलेंगी। भूतल पर 'द प्रेस्टीज गैलरी' और पहली मंजिल पर 'दक्कन पठार के खनिज' नाम से दो गैलरी हैं। आप निश्चित रूप से आसपास की प्राकृतिक सुंदरता से प्रभावित होंगे जो वातावरण को शांत और संतुष्टिदायक बनाते हैं। भारत में, गारगोटी संग्रहालय एकमात्र ऐसा संग्रहालय है जो पृथ्वी के विभिन्न खनिज खजाने को प्रदर्शित करता है। इनमें विभिन्न क्रिस्टल, खनिज और चट्टानें शामिल हैं जो आकार, प्रकृति, रंग और अनुप्रयोग में भिन्न होती हैं।

संग्रहालय में हरे क्यूबिकल एपोफिलाइट, हीरे, कैवनसाइट, कटे हुए पत्थर, नीले-हरे एक्वामरीन, पीले कैल्साइट के साथ-साथ कुछ बहुत ही दुर्लभ विदेशी खनिजों का प्रदर्शन है। आप एक स्मारिका दुकान भी पा सकते हैं जो संग्रहालय के बगल में है।

वहां से, आप विभिन्न हार, लैपिडरी आइटम, खनिज नमूने, पोस्ट कार्ड चित्र और कई अन्य चीजें खरीद सकते हैं। 'सरस्वती पुरस्कार', 'सिन्नर गौरव' उन पुरस्कारों में से कुछ हैं जो एक पूर्व मर्चेंट नेवी अधिकारी श्री कृष्ण चंद्र पांडे द्वारा स्थापित इस मंत्रमुग्ध संग्रहालय की सराहना करने के लिए दिए गए हैं। गारगोटी संग्रहालय भारत का एकमात्र संग्रहालय है जो प्रकृति, आकार, रंग और अनुप्रयोग में भिन्न चट्टानों, खनिजों और क्रिस्टल जैसे पृथ्वी के खनिज खजाने को प्रदर्शित करता है। संग्रहालयों में प्रदर्शित प्रदर्शनों में हीरे, कटे हुए पत्थर, हल्के हरे रंग का क्यूबिकल एपोफिलाइट, पीले कैल्साइट के क्रिस्टल, नीले-हरे एक्वामरीन, कैवनसाइट और दुर्लभ विदेशी खनिजों के नमूने शामिल हैं। इसलिए जब भी आप नासिक आएं तो संग्रहालय देखने का मौका न चूकें। स्थान चिह्न

कॉर्पोरेट कार्यालय
"गार्गोटी" खनिज संग्रहालय,
डी-59, एमआईडीसी, मालेगांव, सिन्नर, महाराष्ट्र। भारत - 422113.
फ़ोन: +91-2551-230865, +91-2551-230528 सेल: 09890655592. फ़ैक्स: +91-253-2414598.

दगडांच्या देशा : गारगोटीचे जागतिक महत्त्व ध्यानात घ्या!

टिम इ सकाळ

लेखक : के, सी. पांडे

माझ्या जीवनात गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय (Gargoti International Museum) व शिर्डी साई संस्थान यांचे एक अतूट नाते राहिले आहे. शिर्डी येथील माझ्या नऊ एकर जमिनीत ‘साई अक्षरधाम’ हा जागतिक दर्जाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा मी संकल्प केला आहे. हा प्रकल्प जगातील वैविध्यपूर्ण रचना असलेला एका छत्राखाली अनेक बाबी असलेला नव्हे, तर परदेशातही एकमेव असेल, असा माझा मानस आहे. (Consider global importance of gargoti museum saptarang marathi article by k c pande nashik news)


गारगोटी संग्रहालयाला भेट देत पाहणी करताना बाबा रामदेव.

गारगोटी संग्रहालयाला भेट देत पाहणी करताना बाबा रामदेव.

गारगोटी जगभर प्रसिद्ध झाल्यानंतर शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आठ वर्षांची माझी कारकीर्द अत्यंत समाधानकारक राहिली. या माध्यमातून मला साईबाबा व साईभक्त यांची वेगवेगळ्या प्रकारे निःस्वार्थपणे सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली. शिर्डी येथील माझ्या जमिनीत ‘साई अक्षरधाम’ हा प्रकल्प सुरू करण्याचा मी निश्चय केला. जेव्हा मी गारगोटीबद्दल मनाशी खूणगाठ बांधली होती, की यामुळे मला एक दिवस वैश्विक दर्जाची ओळख निर्माण होईल आणि ते खरे झाले. कुठलीही पार्श्वभूमी नसताना सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसीमध्ये मी गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना केली. नाशिकपासून वीस किलोमीटरवर असलेले संग्रहालय बघण्यासाठी देश-परदेशातून शेकडो लोक नियमितपणे भेट देत असतात. तेव्हाच माझ्या मनात विचार आला, की मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी नाशिक-सिन्नरमार्गे जावे लागते. साई दर्शनासाठी रोज हजारो लोक देशातील वेगवेगळ्या ठिकाणातून येत असतात. शिर्डी येथील माझ्या मालकीच्या जमिनीवर ‘अक्षरधाम’ या नावाने जागतिक दर्जाचा प्रकल्प उभा केला, तर तेथे अजून एक पर्यटनस्थळ शिर्डीत येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी उपलब्ध होईल. माझा साईभक्तीबद्दलचा सेवाभावही मला साकारता येईल.

शिर्डी येथील साई अक्षरधामचे संकल्पचित्र.

शिर्डी येथील साई अक्षरधामचे संकल्पचित्र.

‘साई अक्षरधाम’ या प्रकल्पात साईंचा चित्रमय प्रवास, जगातील गारगोटी मिनरलचे एक्झिबिशन, जागतिक दर्जाचा लेझर शो, फूड हब, मिनरलॉजी रिसर्च सेंटर, ऑडिटोरियम, प्रशस्त पार्किंग, साई अक्षरधामचे वैविध्यपूर्ण स्ट्रक्चर, हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड, मेडिटेशन हॉल, काचेची एक स्वतंत्र इमारत कलाकृतीद्वारे त्यास डायनासोरचा आकार देऊन बनविण्यात येईल. गार्डन, योगा सेंटर अशा एक ना अनेक सेवा तेथे देण्यात येतील.

आपला देश यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक व मानवनिर्मित पर्यटन लाभलेल्याचा वारसा आहे. पर्यटनास वाव मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील असते. पण यात शासनाने अधिक सजग होणे गरजेचे आहे. ताजमहल, अजिंठा, वेरूळ याव्यतिरिक्तही अनेक पर्यटन क्षेत्रे आहेत, यात गारगोटीचाही समावेश आहे, अशी शासनदरबारी नोंदही आहे. पण शासनाकडून पर्यटन क्षेत्रासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. ‘साई अक्षरधाम’सारख्या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाची शिर्डीत निर्मिती केल्यानंतर स्थानिक लोकांना रोजगार सभोवतालच्या परिसराचा विकास, कर स्वरूपात शासनाला मिळणारा महसूल असे अनेक फायदे शासनास होणार आहेत. तरीही काही बाबतीत शासनदरबारी उदासीनता आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थ भांडवल लागणार आहे. वित्तपुरवठा करणाऱ्या बकांनी त्यांच्या पॉलिसीत काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. गारगोटीची ओळख जागतिक स्तरावर आहे, तर निश्चितच गारगोटीची श्रीमंती ही आपोआपच लक्षात येईल.

प्रस्तावित साईअक्षर धाममधील काचेची इमारत असे अशा आकाराची.

प्रस्तावित साईअक्षर धाममधील काचेची इमारत असे अशा आकाराची.

नाशिक-सिन्नर रस्त्यावर असलेले गारगोटी संग्रहालय नाशिक शहरापासून वीस किलोमीटरवर असूनही देशातून तसेच जगभरातून लोक नियमितपणे भेट देत असतात. यावरूनच जगात गारगोटीचे काय स्थान आहे, हे वित्तीय संस्थांनी समजून घेण्याची गरज आहे. त्याचे योग्य मूल्यमापन करून पुढे यावे, असे माझे मत आहे. (लेखक सिन्नरस्थित आंतरराष्ट्रीय गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

कॅव्हनसाइट

कॅव्हनसाइट

कॅव्हनसाइट

रासायनिक रचना : कॅल्शियम व्हॅनेडियम सिलिकेट

फायदे : कॅव्हनसाइट हा एक दगड आहे, जो विविध मानसिक समस्यांसह मदत करू शकतो. तिसरा डोळा आणि तिसरा डोळा उत्तेजित करून ते अंतर्ज्ञान, मानसिक जागरूकता आणि चॅनेल प्रतिभा नाटकीयरीत्या वाढवू शकते. हे मानसिक उपचारांमध्ये खूप फायदेशीर आहे.

परिसर : पुणे

खडकातले सौंदर्य

सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयाला ज्यांनी भेट दिली असेल त्यांचे डोळे तेथील भूरत्नांची दुनिया पाहून विस्फारले असतील. अशीच स्थिती नगर येथील बहिरनाथ वाकळे यांच्या घरी गेल्यावर आपली होते. वरून ओबडधोबड दगड, पण आतमध्ये स्फटिकाचे फूल फुललेले...काहींचा आकार तीक्ष्ण सुयांसारखा, काही खोब-यासारखे, तर काही पांढ-या शुभ्र कापसासारखे. काहींचा रंग निळाभोर, तर काहींना गुलाबी-जांभळी छटा. काहींमधून पाझरणारा हिरवा रंग, तर काहींमध्ये एकाच दगडात तीन-चार रंग सामावलेले. कॅलसाइट, कॅवनसाइट, स्टीलबाइट, स्टीलराइट, अ‍ॅपॉफिलाइट, अ‍ॅमथिस्ट, मेसोलाइट अशा अनेक नावांनी या गारगोट्या ओळखल्या जातात. रांगोळीसाठी वापरले जाणारे सामान्य शिरगोळे आणि हि-यासारखी अमूल्य रत्ने यांचीच ही भावंडे. ज्वालामुखी शांत होताना खडकात काही पोकळ्या निर्माण होऊन तेथे विविध रसायने साचतात. त्यातून मिनरल्सचे वेगवेगळे प्रकार तयार होतात. जेवढी कठीणता आणि पारदर्शकता जास्त तेवढे त्याचे मूल्य अधिक. या छंदाची सुरुवात कशी झाली याविषयी वाकळे सांगतात - ‘पूर्वी आम्ही सावेडी गावात राहत. त्या काळी शहराजवळून सीना नदी वाहत असे. नदीतील वाळूत आम्ही खेळायचो. वाळूत रंगीत खडे सापडायचे. ते गोळा करून मी बाटल्यांमध्ये साठवत असे.’ हा छंद त्यांनी मोठेपणीही जोपासला. इंटरनेटवरून मिनरल्सची माहिती मिळवायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचे प्रकार, वैशिष्ट्ये, वेगळेपण, किमती अशा अनेक गोष्टी जशा कळायला लागल्या. त्याबरोबर गारगोट्यांचे महत्त्व लक्षात यायला लागले. नगर जिल्ह्यात राहुरी, पारनेर, सावळीविहीर या भागांत हे दगड सापडतात. एखाद्या विहिरीत किंवा खाणीत गारांचा थर सापडल्याचे समजले की, वाकळे तिथे जातात. रत्नपारखी जशी रत्नांची परीक्षा करतो तशी परीक्षा ते खडकांची करतात. मग तो खडक नीट कापून त्यातला निसर्गदत्त ठेवा ते उकलतात.
वाकळे यांच्या घरातील शोकेसमध्ये गारगोट्यांचे 30-35 प्रकार पाहायला मिळतात. काही गारगोट्या त्यांनी अहमदनगर महाविद्यालयाला दिल्या आहेत.
गारगोट्यांच्या जोडीने वाकळे यांच्या घरात विविध विषयांवरील ग्रंथही नांदताना दिसतात. अनेक अँटिक वस्तूही त्यांनी जमवल्या आहेत. शंभर वर्षांपूर्वीच्या बग्गीचा टॉर्च, घरगुती सिनेमा पाहण्यासाठी वापरला जाणारा फिल्म प्रोजेक्टर अशा काही खास चिजा त्यांच्याकडे आहेत. या सगळ्याचे संग्रहालय लवकरच उभे राहिलेले दिसेल.

https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-stone-art-sinnar-3462809.html


https://gargoti.com/
























No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...