Sunday, January 2, 2022

रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड

 तोफांचा किल्ला’ असा उल्लेख ज्या किल्ल्याचा केला जातो तो किल्ला म्हणजे रसाळगड. शहरापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या रसाळगड किल्ल्याचा इतिहास तसा गौरवशाली आहे. तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड, महिमंडणगड हे डोंगर रांग आजही अभिमानाने छाती फुगवून उभी आहे. त्याच पर्वत रांगेवर रसाळगड किल्ला इतिहासाचा साक्षीदार म्हणून आजही गौरवगाथा सांगत आहे. रसाळगड नावाप्रमाणे रसाळ आहे. गडाचा घेरा ५ ते ७ एकर मध्ये वसलेला आहे. या किल्ल्याची गौरवगाथा सांगायची झाली तर १९६० च्या मोहिमेत शिवाजी महाराजांनी रसाळगड जिंकला. आणि पुढे १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी पुन्हा रसाळगड ताब्यात घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेंकडून सर्व किल्ले घेतले. मात्र रसाळगड तेवढा राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड त्यांच्या ताब्यात आला असल्याचे सांगण्यात येते.

 












































































किल्ल्याची उभारणी १४ व्या शतकात म्हणजेच शिलाहार काळात झालेली आहे. हा किल्ला बांधण्यामागे स्वराज्यामध्ये किल्ल्यावरुन मावळयांना रसद पुरवणे याच हेतू पोटी याची उभारणी करण्यात आली होती. समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचीवर व कोरीव कातळावर असलेल्या रसाळगड किल्यावर ३८ तोफा होत्या. मात्र सद्य स्थितीत चारच तोफा आढळून येतात. या किल्ल्यावर जावळीचे मोरे, छत्रपती शिवराय, राणी ताराबाई, तानाजी आंग्रे, पेशवे व इंग्रज यांनी सत्ता गाजवलेला हा किल्ला आहे.

किल्ल्यावर ४ बुरुज चोरवाटा, स्वयंपाकगृह, विश्रांतीगृह, राजवाडा, बालेकिल्ला, प्रवेशद्वार, घोड्यांच्या पागा, हनुमानमंदिर, झोलाई-वाघजाई मंदिर, गणपती मंदिर, पाण्याचा तलाव, धान्य कोठार, तसेच अनेक ज्ञात अज्ञातांच्या समाधी स्थळे त्याचबरोबर विविध देव देवतांच्या मुर्त्या असलेला एकमेव सुस्थितीत असलेला किल्ला उभा आहे. परंतु या किल्ल्याला राज्य स्मारक घोषित केल्या नंतर दुर्गाचे सुशोभिकरण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात निधी आला होता. परंतु या निधीचा संबंधित विभाग व ठेकेदारांनी गैरवापर करुन रसाळगड दुर्गाचे विद्रुपीकरण करण्यात आल्याने रसाळगड किल्ल्याचे वैभव झाकोळले गेले होते. मात्र याबाबत शिवप्रेमी, गडकोट संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सारख्यांनी या किल्ल्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्याकरीता लावलेला जनरेटा यामुळेच सद्यस्थितीत या किल्ल्याला सुस्थिती प्राप्त झाली आहे. विकास कामांचा निधी कोटीच्या कोटी खर्ची पडून देखील या किल्ल्याची अजूनही सुशोभिकरण करण्यात न आल्याने ते नेमके होणार तरी कधी? हाच यक्ष प्रश्न दुर्ग प्रेमींना सतावत होता.
         दरम्यान, किल्ले रसाळगडावर शिवकालीन असलेल्या तोफा आजही अस्तावस्त किल्ले परिसरात आढळून येतात. त्यापैकी काही तोफा गडकोट प्रेमींनी एकत्र ठेवल्या आहेत. मात्र बुरूजावर असलेल्या अनेक तोफा जाग्यावरच नसल्यामुळे त्यांची व्यवस्था लावण्याची आर्त मागणी गडकोट प्रेमींमधून होत होती. अखेर पुरातत्व विभागाने याबाबत तोफा सुरक्षित होण्याच्या दृष्टीने पावले उचलत तोफांभोवती गाडे तयार करण्यात येणार आहेत


सुमारगड
काही गडांची नावं कायम एकत्रच घेतली जातात. अलंग-मदन-कुलंग, साल्हेर-सालोटा, मुल्हेर-मोरा तसंच हेही, रसाळ-सुमार-महिपतगड. हे नाव ऐकून एखाद दोन वर्ष झाली असतील तेव्हा जमले नाही, तेव्हापासून योगही आला नव्हता. गेल्या महिन्यात एका भटक्यांच्या भेटीत तिथे जायचं वगैरे बोलणही झालं होतं पण तसं काही नियोजन झाले नाही. कर्मधर्मसंयोगाने एका व्हाट्सअप ग्रुप वर 1 pdf  मिळाली. “Pune Venturers” नावाच्या ग्रुपचा प्लॅन  होता 10-11 मार्चला. आता दोन गोष्टी समोर आल्या. एक तर त्यात कोणीच ओळखीचे नव्हते, माझ्यासाठी पूर्ण ग्रुपच नवीन होता आणि दुसरे म्हणजे घरून परवानगी. एक तर हा ट्रेक करायचाच होता. त्यामुळे ओळखी-अनोळखी हा प्रश्न निकालात निघाला. पण महत्त्वाचं होतं घरून परवानगी. ती पण नशिबाने मिळाली. लगेचच confirmation कळवले. शेवटची एकच सीट शिल्लक होती माझ्या नशिबाने. होळीला मला घरी जायचे असल्याने आगाऊ रक्कमही त्यांना देणं शक्य नव्हतं. Online transfer option  त्यांच्याकडे नव्हता, पण त्यांनी विश्वासावर माझी जागा नक्की करून ठेवलंनी. दोन दिवस पाठीवरच वागवावं लागणार या हिशोबाने सामान बांधले. शुक्रवारी रात्री सव्वानऊला सारसबाग जवळून गाडीत बसलो. गाडीत माझ्याबरोबर अजून दोन-चार जण होते, अजून तरी  मी कोणालाच ओळखत नव्हतो. सगळे माझ्यापेक्षा बर्‍यापैकी मोठे लोक होते, वयाने आणि अनुभवाने पण. मग एकमेकांना गोळा करत गाडी university road, चिंचवड असं करत हिंजवडीतून ताम्हिणीला लागली. झोपेचा लपंडाव चालू होता. माणगांव-महाड-पोलादपूर सोडून कशेडी घाट उतरला आणि खेडला आलो. रत्नागिरी जिल्ह्यात यायला मिळण्याचा हा सलग दुसरा विकांत. पूर्ण काळोखी रात्र असल्याने रस्ता फारच भयाण वाटत होता त्यात डांबरी रस्ता संपला आणि कच्चा मातीचा रस्ता चालू झाला. डोंगर पोखरूनच ह्या नवीन रस्त्याचे काम चालू असल्याने खाली फक्त लाल माती. एका बाजूला कडा, तर दुसऱ्या बाजूला दरी. रस्त्याला पाट्या नाहीतच. बाजूला पट्ट्या मारलेल्या नाहीत. कडेला गेले तर गच्छंतीच. मस्त घाट बांधून काढत होते. कच्चा रस्ता सुरु व्हायच्या आधी पाट्या लागल्या होत्या, त्यातून रस्त्याला फाटा असा नव्हताच त्यामुळे हा रस्ता सरळ नक्कीच वाडी-बेलदार या गावात जातो हे खात्रीशीर होते. फक्त रस्ता जाण्यायोग्य वाटत नव्हता. आमच्या ग्रुपमधले एक-दोन जण त्यांच्या खाजगी नॅनो गाडीने रात्रीच तिथे पोहोचले असल्याने गाडी तिथपर्यंत जाते हे माहिती होते. किंबहुना त्या भरवशावरच निघालो होतो. वाटेत बोर्ड नव्हतेच आणि मध्यरात्र उलटून गेलेली असल्यामुळे माणसेही दिसत नव्हती (तशीही इथे दिवसाही दिसण्याची शक्यता कमीच!) कोणाला विचारण्याचा प्रश्नच नव्हता. मोबाईलवरचा google map आणि काल गेलेली नॅनो गाडी यांच्या भरवशावर चाललो होतो. काही किलोमीटर झाले असतील आणि शंका यायला लागली. एक तर त्या रस्त्याने नॅनो गाडी वर चढू शकेल अशी शक्यता वाटत नव्हती. ड्रायव्हरही मनातून थोडा घाबरलेला समजत होता. पूर्ण यू-टर्न असणारी वळणं, मध्येच खडा चढाव, दरी अशातून ते गाव सापडत नव्हतं. एक तर गाडी वळवायला जागाही दिसत नव्हती. आमची १७ सीटर बर्‍यापैकी मोठी बस असल्यामुळे तिला जागाही जास्ती लागणार होती. अखेरीस एका ठिकाणी गाडी उभी असलेली दिसली, नॅनो नव्हती ही. पण रस्ता संपला होता. पुढे सरळ शेतच होतं.
वाडी-बेलदारला येणारा वळणावळणाचा कच्चा रस्ता
गाईड सीताराम जाधव
आम्ही चार जण उतरलो आणि शेजारी असलेल्या घरात गेलो. तिथे गेल्यावर आमचे आधीचे आलेले दोन जण ओसरीवर झोपलेले दिसले. जीवात जीव आला. तिथे सीताराम जाधव भेटणार होते. शेजारच्या घरातून एक व्यक्ती आली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सीताराम जाधवना उठवलं. आता सगळे लोकं आपले सामान घेऊन त्या अंगणात येऊन बसले. झोपण्याला काही अर्थच नव्हता. सरळ आवरायला घेतलं. तोंड धुतलं. ग्रुपच्या लीडर लोकांनी घरातून आणलेला शिधा घेऊन उपमा करण्यास सुरुवात केली. आम्ही आपापली सकाळची कामे आटपून त्यांच्या मदतीला गेलो. चुलीवरच चहा ठेवला गेला. सगळ्यांनी चहा घेतला आणि साडेसहा वाजता सुमारगडाकडे वाटचाल चालू केली. तोपर्यंत माहितीच नव्हते की नक्की पहिल्यांदी कुठे जायचे आहे. शक्यतो हा ट्रेक  रसाळगडला सुरु करुन सुमार वरून महिपतगडला संपवतात. परंतु आमच्या ग्रुपचा प्लॅन वेगळा होता. आम्ही 18 जण होतो, त्यातले तीन जण पंचाहत्तरीच्या आसपासचे. पाच-सहा जण साठ-पासष्ठच्या दरम्यानचे आणि बरेचसे ३०-४० च्या दरम्यानचे होते. एकच मुलगी होती, ती चौदा वर्षाची. त्यामुळे प्लॅन थोडा वेगळा होता. सोबतीला सीताराम जाधव आमचे गाईड म्हणून असल्याने वाट शोधावी लागणार नव्हती. त्यांच्या घरातून निघून शेतं ओलांडल्यावर एक पठार लागले. डाव्या बाजूला लांबवर वाडी-बेलदार दिसत होते तर उजव्या बाजूला काल रात्री आम्ही चढून आलेला घाट. वाडी-जैतापूर हे गावही दिसत होते. वाडी-बेलदार गावातल्या लोकांना काहीही आणायचे असेल तर ह्या जैतापुरात चालत जावे लागते, अगदी बस मिळवण्यासाठी सुद्धा. त्या पठारावरून चालत गेल्यावर आम्ही जंगलात घुसलो. काही थोडक्या खुणा लक्षात ठेवत पुढे निघालो, वाटेत एका धनगराचे झाप लागले. पुढे परत जंगलच. अर्थात आम्ही काही विचार न करता फक्त चालत होतो, वाट सीताराम जाधव दाखवत होते. सगळे बरोबर आहेत ना याची खात्री मध्ये मध्ये केली जात होती. साठ-पासष्टीच्या पुढचे तरुणसुद्धा जोमाने चालत होते. आता एक यु-टर्न लागला जिथे रसाळगडकडून येणारी वाट मिळत होती. गुरांना जाण्यास प्रतिबंध म्हणून वाटेत काठ्या टाकून ठेवलेल्या आहेत. ही वाट उजवीकडे रसाळगडाकडे जाते, तर डावीकडे सुमारगडाकडे. आम्ही डावीकडून वरच्या बाजूला सुमारगडाकडे चाललो. वाडी बेलदार मधून इथे यायला आम्हाला साधारण तासभर पुरला होता. आता खडा चढ चालू झाला होता. परत गुरांनी जाऊ नये यासाठी बेडं टाकलेलं दिसलं. ते ओलांडून पुढे गेलो आणि मग वळसा घेत गेलेल्या वाटेवरून सुमारगडाचे सुंदर दर्शन झाले. या जंगलात बरेचसे वन्यप्राणी आहेत त्यात बिबट्याही आहे. थोड्याच अंतरावर आम्हाला बिबट्याच्या पायाचे ठसे त्याची खात्री देऊन गेले. आमच्याबरोबर सिताराम जाधव असल्यामुळेच अर्थात ते कळले होते, नाही तर त्यावर पाय देऊन आम्ही पुढे गेलो असतो. लाल मातीत ते ठळक ठसे छान नक्षी उमटवून होते. एक छोटासा रॉक पॅच लागला. मागच्या बाजूला दृश्य फारच छान होते.
बिबट्याच्या पायाचे ठसे
समोर वाट संपली असे वाटणारा एक काळा-कभिन्न कातळकडा आला. इथे क्षणभर विश्रांती घेतल्यावर त्याच्या डावीकडून वळसा मारुन पुढे निघालो. आता धोकादायक वाट चालू झाली. एक भुयार लागले त्यात बराच कचरा होता. आतमध्ये जाण्यास काही वाव नव्हता पण ते भुयार आपण गडावर आलो आहोत अशी निशाणी ठेवून गेले. डावीकडे दरीच तर उजवीकडे कडा धरूनच पुढे पुढे जात राहायचे. वाटेत एका धोकादायक ठिकाणी एक मजबूत झाड चांगला आधार देऊन जाते किंबहुना त्या झाडामुळेच पुढे सहज जाता येते नाहीतर कदाचित दोऱ्या बांधाव्या लागल्या असत्या. आमच्याकडे दोऱ्या होत्याच गरजेला. ही वाट अतिशय खडतर आहे. पुढे उजव्या बाजूला कातळात अजून एक भुयार दिसले. हे भुयार म्हणजे पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता होता कारण आतमध्ये पाणी होतेच. घाणही बरीच होती. ती आत मध्ये राहणाऱ्या वटवाघळांनी केलेली होती. आत वटवाघळं उलटी लटकलेली दिसत होती. पुढे निघालो आणि एक कठीण अशी जागा आली. जिथे अतिशय लहान जागा होती पुढे सरकण्यासाठी. दगडाकडे तोंड करूनच अशा वाटेवरुन पुढे जायचे असते, दरीकडे कधीही तोंड करू नये. आपले वजन दगडाकडे झुकवून सरकत-सरकत पुढे जायचे. मी बारीक असल्याने मला ते सोपे गेले. काहीजणांना थोडी कसरत करावी लागली. पुढे जाऊन मग बाकीच्यांना आधार देत पुढे येण्यास मदत केली. ह्या भानगडीत मी सगळ्यात शेवटी राहिलो होतो माझ्याबरोबर राहुल होता. आता उजवीकडे आणखीन एक भुयार दिसले. हे कोरडे होते. पुन्हा मी बारीक असल्याचा फायदा घेऊन आत मध्ये घुसलो. पुढे “L” शेपमध्ये भुयार उजवीकडे वळत होते. उजवीकडे वळल्यावर मात्र पुढे पाणी दिसले, तिथे जाणे धोक्याचे होते आणि काही विशेषही बघण्यासारखे नव्हते. मागे फिरलो आणि रांगत-रांगत परत भुयाराच्या बाहेर आलो.
धोकादायक वाट
तोपर्यंत सगळी मंडळी पुढे जाऊन वरती उजवीकडे वळण घेऊन जवळजवळच गडावर पोचत होती. इथे एक प्रचंड कठीण असा रॉक पॅच आहे. पण आता एका लोखंडी शिडी लाऊन हा मार्ग सोपा केला आहे. शिडी फार पक्की नसली तरी आपले काम चोख करते. आमचे गाईड मात्र इथेच थांबले. कधीतरी ह्या शिडीवरून पडल्याने त्यांच्या मनात भीती बसली होती. इथपर्यंत खडतर वाटेवरून पायात नुसत्या स्लीपर घालून लीलया आलेले ते सोप्या शिडीला मात्र भ्यायले होते. ह्या शिडीवरून आम्ही वर आलो. पुढे वाट चिंचोळी असली तरी रेलिंग बांधलेले आहे. आता वरती डावीकडे कडा आणि उजवीकडे दरी अशी वाट आहे. खडकात सतीची शिळा ठेवली आहे. थोडं पुढे गेल्यावर अजून एक गुहा आहे, त्यात काही निरांजन वगैरे ठेवलेले दिसते पण आतमध्ये देव नाही. आता गडाची तटबंदी चालू झालेली होती.


सतीची शिळा आणि मी
गडावर पोचल्यावर वाट डावीकडे जाते तिथून सुरुवात करावी. सुरुवातीलाच समोरच दोन मोठ्या टाक्या दिसतात. टाक्यांच्या आधीच एक मंदिरासारखी रचना आहेत त्यात काही काही देव एकत्र करून ठेवलेले आहेत. तिथे शंकराची पिंड आहे, त्यातल्या साळुंका गायब आहेत. ह्या टाक्यांच्या डावीकडे गुहेत शंकराचे मंदिर आहे, त्यात अजूनही मूर्ती आहेत, बहुतेक भोलाईदेवीची मुर्तीही असावी. लगेचच पुढे टाक्यांच्या पलीकडे भुयारात दोन खांबी टाके आहे. हे पाणी पिण्यायोग्य अतिशय सुंदर आहे. पाणी पिऊन मागे असलेल्या गुहेत परत आलो. महाशिवरात्रीचा उत्सव होऊन गेल्यामुळे मंदिर सजवलेले होते. पिंडीच्या मागे काही आकृत्या रेखाटलेल्या आहेत. समया, घंटा, अभिषेकपात्रही आहे. पूजेचं सर्व साहीत्य आहे, तसंच कळशी, हंडा, ताट-वाट्या असे बरेच साहित्य आहे. डावीकडून पुढे गेल्यावर एक मंडपाचा सांगाडा उभारलेला आहे. हा उत्सवासाठी उभारलेला असावा. गडाच्या अवशेषांवरच हे बांधकाम आहे. अजून एक चौथरा इथे दिसतो. समोरच एक कोठार असावे, तेथेही भुयारात एक पाण्याचे टाके आहे. उजवीकडे वरच्या बाजूला एक चौथरा आणि त्यावर ध्वज दिसतो. आधी तिथे न जाता जवळचे अवशेष बघून घ्यावेत. याच परिसरात आणखी एक टाके आहे त्यातही पाणी पिणे योग्य दिसले. पालापाचोळा बऱ्यापैकी त्यात असला तरी पाणी स्वच्छ दिसत होते. डावीकडून आपली गडफेरी चालू ठेवावी. पुढे अजून एक चौथरा आहे त्याला वळसा मारल्यावर उजवीकडे पाण्याचे एक खांबी टाके आहे. पाणी पिण्यायोग्य वाटले नाही. वळसा मारून वर गेल्यावर गडाचे सर्वोच्च टोक लागते. अवशेष अजून काहीही नाहीत. इथून आपल्याला खालच्या बाजूला पाण्याची टाकी मंदिर वगैरे नजारा दिसतो. पलीकडे बघितल्यावर मधु-मकरंदगड दिसतात तसेच महिपतगड दिसतो.
सुमारगडावरची पाण्याची टाकी
आल्या वाटेने परत निघायचे आणि जीथं वर चढलो त्याच ठिकाणी अजून एक पाण्याचे टाके आहे तेही बघायचे. हे एक खांबी टाके आहे. त्याच्याच वरच्या बाजूला दोन तीन खोल्या आहेत, पण त्यात आज जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित राहिलेला नाही. सगळे खाली उतरत असल्यामुळे मी पटकन त्यावर नजर टाकून परतीला लागलो. आल्या वाटेने गड उतरायला सुरुवात केली सगळ्यात पुढे नामजोशी काका होते मागे वळून बघितल्यावर सुमारगड छान दिसत होता. पुन्हा रसाळगडाची वाट लागली आणि तिकडे न जाता उजवीकडच्या वाटेने निघालो. आता ऊन वाढलं होतं. रस्ता चुकण्याची शक्यता वाटत नव्हती. आमचे गाईड जरी मागे असले तरी समोरची पायवाट धरून आम्ही उतरणीला लागलो. मध्ये खूप अंतर पडल्याचे लक्षात आलं आणि आम्ही वाट बघत थांबलो. सुमारे २-३ ठिकाणी मिळून अर्धा-पाऊण तास वाट बघितली. सगळे लोक परत आले. डावीकडे ती घाटवाट ठेवत उजवीकडे दिसत असलेल्या सीताराम जाधव यांच्या घरी परत आलो होतो. सगळेच थकले होते. सुमारे साडेअकरा वाजले होते. एक-एक करत सगळे परत आले.

ही तरी...


महिपतगड
थोडासा फराळ केला आणि एक वाजायच्या आधीच महिपतगडकडे वाटचाल चालू केली. सिताराम जाधव यांच्या घराच्या मागच्या बाजूने ही वाट वरती महिपतगडाकडे जाते. वाटेतच 5 मिनिटांवरच एक विहीर आहे. ह्या विहीरीचे पाणी हे सर्व लोक पिण्यासाठी वापरतात. वाडी-बेलदार गावात ५-७ घरं मिळून सुमारे १८-२० लोकच राहतात. बहुतेकांची मुलेबाळे शिक्षणासाठी-नोकरीनिमित्त मुंबईत आहेत. या विहिरीतले पाणी अत्यंत सुंदर आहे. सीताराम काकांच्या बोलण्यातून विहिरीचे कौतुक लपत नव्हते. त्यांनी खास काढणे आणि Can आणला होता पाण्यासाठी. आम्ही आपापल्या बाटल्यात पाणी भरून घेतले आणि विहीर उजवीकडे ठेवत डाव्या बाजूच्या वाटेने वर निघालो. येथून वळून पाहिले तर सुमारगड स्पष्ट दिसतो. ही वाट चुकण्याची फारशी शक्यता नाही, मळलेली आहे. डावीकडेच काही अंतरावर एक बुरुज स्पष्ट दिसतो हा बुरुज आपल्याला सुरुवातीपासूनच खुणावत असतो पण तरीही हा बुरुज डावीकडे ठेवत आपण पुढे गेल्यावर समोरच एक बांधकाम दिसते आणि त्यातले एकही भोकही. इथे परत इतरांची वाट बघत थांबलो. सर्वांना येऊ दिले. इथे यायला जेमतेम ३० मिनिटे पुरतात. हे बांधकाम म्हणजे खेड/गायमुख दरवाजा. त्याच्या मागून वाटेने पुढे गेल्यावर अजून एक मोठी बांधीव विहीर आहे. या विहिरीला पंप लावून पाणी गावात यायची सोय केली आहे.
खेड/गायमुख दरवाजा
विहिरीच्या डावीकडून वाट पारेश्वर मंदिराकडे जाते. तिकडे आधी न जाता ही विहीर समोर ठेवत उजवीकडे जावे. इथून गडाचे अवशेष दिसायला सुरू होतात. आमच्याबरोबर वाटाड्या असल्यामुळेच हे अवशेष शोधायला त्रास पडला नाही. गडावर पूर्णपणे जंगल पसरलेले असल्यामुळे वाटाड्या सोबत असणे गरजेचे ठरते नाहीतर खूप वेळ जाईल. जंगल घनदाट आहे समोरच जोत्यावर एक मंदिर आहे ज्यावर हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती ठेवली आहे. ह्या मूर्ती पश्चिममुखी आहेत. या मूर्तीजवळ आम्ही आरती केली. परत मागे फिरून आम्ही उजव्या बाजूला दिसत असलेल्या अवशेषांकडे गेलो इथे तीन मोठे चौथरे दिसतात. जागोजागी मुंग्यांचे वारूळही आहेत. थोडे डावीकडे घेऊन गेल्यावर 1 पीराचे ठिकाण दिसते. हे अतिशय सुंदर दगडी बांधकाम आहे.
पश्चिमाभिमुख मारुती आणि गणपती
पीराचे ठिकाण - सुंदर बांधकाम
ही वाट अशीच घनदाट जंगलातून पुन्हा मोकळ्या जागेत जाते तिथे होळीचा माळ आहे. तिथेही काही अवशेष शिल्लक आहेत. तिथून पुढे गेल्यावर वाटेत पूर्वाभिमुख हनुमानाची मूर्ती आहे तर शंकराची पिंडही आहे. आमच्या वाटाड्यानी मात्र ती आम्हाला दाखवलनी नाही. पुढे वाट उत्तरेकडे असलेल्या कोतवाल दरवाजाकडे जाते. त्याचेही काही अवशेष शिल्लक नाहीत. पूर्वेला पुसाटी दरवाजा आहे असे उल्लेख आहेत. समोर महाबळेश्वर दिसते. शेजारीच भीमाची काठी, मधु-मकरंदगड, पर्वत, चकदेव तर खालच्या बाजूला उजवीकडे वडगाव दिसते. समोर डावीकडे प्रतापगड असावा. उजवीकडून पुढे गेल्यावर समोरच सुमारगड दिसतो. इथून वाट खाली वडगावमध्ये उतरते. इथून खालच्या बाजूला आग्नेयेस यशवंतदिंडी दरवाजा आणि २ बुरुज आहेत. तिथे न वापरलेल्या चुन्याचे काही अवशेषही आहेत. तिकडे खालच्या बाजूला न जाता वरतीच एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही मागे फिरलो.
ग्रुप फोटो
आता आमचे ठिकाण होते पारेश्वर मंदिर. या मंदिराजवळ लहान-मोठे बरेच अवशेष शिल्लक आहेत एक चौथरा आहे. मंदिराच्या जवळच डावीकडे काही अवशेष आहेत मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे मंदिरात बऱ्याच छोट्या छोट्या मूर्ती असून पारेश्वराची  शंकराची पिंड आहे तसेच त्रिशूळ घेतलेली एक मूर्तीही आहे. पिंडीसमोर नंदीची मुर्तीही आहे. समोरच तुळशीवृंदावन असून त्याच्या शेजारी तोफेचा गोळा ही ठेवलेला आहे. मंदिराला उजवीकडे ठेवत डावीकडून एका चौथऱ्याला वळसा मारून परतीच्या वाटेवर पुन्हा काही अवशेष बघायला मिळतात. हे अवशेष सगळे गवतात दडून बसलेले आहेत. डावीकडे ती मोठी विहीर ठेवत उजवीकडे वाट जाते. तिथे गडाची माहिती वाचन झाले. वाट पुढे उजवीकडे जाऊन एका दरवाजाकडे जाते. (शिवगंगा दरवाजा?) इथे पुन्हा शंकराची पिंड-नंदी आहे. एक-दोन तोफगोळे शिल्लक आहेत. थोडी साफसफाई केली, उजव्या बाजूला एक कोरडा पडत चाललेला पाण्याचा साठा आहे. समोरच दहिवलीतून येणारी वाट दिसते. इथे शिवगंगा दरवाजाचे अवशेष असावेत. डावीकडच्या वाटेने गेल्यावर आपण त्या बुरुजावर जातो जो आपल्याला सुरुवातीपासूनच खुणावत होता. इथून आपल्याला गाव स्पष्ट दिसते. उजवीकडे दहिवलीतून वर आलेली वाट शिवगंगा दरवाजाकडे गेलेली दिसते. मागे फिरून पुन्हा उजव्या बाजूला आपण वर येताना आलेल्या वाटेने परत जायचे. साडे चार वाजेपर्यंतच आम्ही खाली परत आलो.

शंकराची पिंड-नंदी. एक-दोन तोफगोळे
किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्नेयेस यशवंत दरवाजा. एक तर त्याचे फारच कमी अवशेष शिल्लक आहेत आणि जे आहेत त्यातलेही सगळे बघायला मिळाले नाही. आता गावात न थांबता जेवून रसाळवाडीला जायचे होते. सव्वा सहाच्या दरम्यान जेवण आमच्या समोर आले. फारशी भूक अशी लागली नव्हती. एक तर ऊन तापत होते आणि ही तशी ही जेवायची वेळही नव्हती. पण जेवायला बसलो. गरम-गरम तांदळाची भाकरी, बटाटा रस्सा, भात आणि मुगाची आमटी. नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी खाल्ली गेली.
रसाळगड
काल रात्री तो घाट चढून आलो होतो त्यावेळी अंधार होता. उतरण्यासाठी सातच्या आधीच तिथून निघालो. आता सगळ्यांनी तो घाट बघितला. रसाळवाडी शोधत निघालो रसाळवाडीचा हा फाटा डावीकडे आहे. तिथून साधारण पाच-सात किलोमीटरवर वाडी आहे. इथेही डांबरी रस्ता असला तरी धाकधूक होतीच. पुन्हा डांबरी रस्ता संपला, कच्चा रस्ता सुरू झाला आणि आम्ही चार जण उतरून पुढे रस्ता बघायला गेलो. ८ वाजून गेले असतील, अंधार पडल्याने काहीच समजत नव्हते. खालच्या बाजूला वाडीत घरं दिसली. आमच्या डोक्यावरचा टॉर्च त्यांना दिसल्यावर खालनं आवाज आले. थोडी चौकशी केली तर साधारण डांबरी रस्ता जिथे संपतो तिथेच आसपास पायर्‍या असाव्यात अशी शक्यता वाटली. तशीही पुढे गाडी नेण्यासारखी जागा नव्हतीच. सरळ मी आणि नितीन असे दोघेजण पायर्‍या शोधात निघालो. पायवाट संपल्यावर पुढे टाकी आणि बांधीव पायर्‍या दिसल्या. आता सगळ्यांना बोलावण्यास काहीच हरकत नव्हती पण खात्री करून घेण्यासाठी तसेच पुढे निघालो.
मिशीवाला हनुमान
साधारण साडेआठ झाले होतेच. पायऱ्या चढून पुढे गेलो आणि एक दरवाजा लागला. दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर काही पायर्‍यानंतर समोरच एक हनुमानाचे मंदिर आहे. विशेष म्हणजे या हनुमानाला असलेली मिशी! उजवीकडून वळसा मारून वर गेल्यावर अजून एक दरवाजा लागतो या दरवाजाला सुंदर कमान आहे. पायऱ्या तशाच पुढे जातात. वाटेत डावीकडे चुन्याचा घाणा दिसतो. हा भाग पुरातत्त्व खात्याने बांधून काढलेला आहे. अजून एक दरवाजा लागला की हा मार्ग संपतो. लगेच डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक अशी तोफ ठेवलेली आहे. समोर पायवाटेने गेल्यावर आम्हाला बॅटरीच्या प्रकाशात ते झोलाई देवीचे मंदिर दिसले. मंदिरा जवळ पोचलो. मागून मुकुंद जाधवसरही आलेच. बाकीच्या मंडळींना बोलावण्याआधी अजून काही खात्री करुन घ्यावी म्हणून मंदिराच्या पलीकडचे पाण्याचे टाके बघून ठेवले. पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिरात विजेची सोय आहे, पंखे आहेत. मंदिरासमोरच दिपमाळ आहे, त्याच चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे, एक लहान तोफही ठेवलेली आहे. जवळ एक चूल मांडलेली दिसते. जवळच लाकडे आहेत. दीपमाळे जवळच तुळशीवृंदावन आणि एक तोफ ठेवलेली आहे. तसंच मंदिराच्या कठड्यावर अजून एक तोफ ठेवलेली आहे. मंदिर झोलाई देवीचे असले तरी अजूनही देव त्यात आहेत. मंदिराच्या आतमध्ये जमवलेल्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. शिवाजी महाराजांची वस्त्र नेसवलेली मुर्तीही आहे. आता मात्र परत सगळे जण खाली गेलो. तिथे कोणाला काहीच माहिती नव्हते. इथेच गड, मंदिर, पाणी सगळे सापडल्याचा सगळ्यांना दिलासा दिला आणि जिथे डांबरी रस्ता संपतो तिथे गाडी लावण्यास सांगितले. सगळे सामान घेऊन परतलो. जेवण झालेलेच होते, आता फक्त झोपायचे बाकी होते. सकाळी पोहे करण्यासाठी लाकडे शोधून ठेवली. सगळ्यांचीच इच्छा झाल्यामुळे चहा झाला. साडेदहा वाजता आम्ही झोपलो. काही जण मंदिराच्या बाहेर झोपले तर काहीजण आतमध्ये.
डोंगराआडून वर येताना सूर्यनारायण
मला ५च्या आधीच जाग आली पण काही चुळबूळ दिसेना, म्हणून वाट बघत तसाच पडून राहीलो. पाच वाजता एक-दोन आवाज आल्यावर लगेच उठलो आणि आवराआवर केली. ती “ठराविक” बाटली घेऊन कामाला गेलो. कालच जागा बघुन ठेवली होती. काम उरकून परत आलो तोपर्यंत अजून काही सुरवंट डोक्यावर लाईट आणि हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन जात होते तर काही फुलपाखर होऊन परत येत होते. पटापट पुढच्या कामाला लागलो. सगळ्यांचं आटपेपर्यंत आम्ही आम्ही चार-पाच जणांनी पोहे बनवले. चहा ठेवला गेला. भरपूर पोहे खाऊन घेतले, चहा घेतला तोपर्यंत सूर्याने डोके वर काढले होते. सूर्योदयाचे कितीतरी फोटो जमा झाले असले तरी कित्येक वेळा तो मोह आवरत नाही तसाच डोंगराआडून वर येताना त्या सूर्यनारायणाचा फोटो घेतला. मंदिरातल्या शिवाजी महाराजांनाही किरणांनी न्हाऊ घालण्याचा त्या सूर्यनारायणाला मोह आवरला नसावा. मला त्याचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. तो घेतला आणि सगळ्यांनी बॅगा भरून गड बघण्यासाठी कूच केली.

झोलाई देवी मंदिर, दीपमाळ आणि ग्रुप फोटो

सुर्यनारायणाने महाराजांना किरणांनी न्हाऊ घातले
मंदिराच्या डावीकडे लागुनच पाण्याचे टाके आहे, पाणी पिण्यायोग्य आहे. ह्यात एक गुहेसारखा भागही दिसतो. त्याच्याही डावीकडे वरच्या बाजूला बालेकिल्ला आहे. त्याच्या आतमध्ये न जाता उजवीकडून वळसा घालून पलीकडे गेलो. गडाची माहिती वाचन झालं. उजवीकडे खाली डांबरी रस्ता दिसत होता, गडावर येण्याची वाटही दिसत होती. डावीकडून गड फेरीला सुरुवात केल्यावर एक बुरूज आहे त्यावर ध्वज आहे. बांधकामाचे अवशेष असे बऱ्यापैकी आहेत. इथे एक तोफही आहे. एक पाण्याचा मोठा साठा आहे पण पाणी पिणे योग्य वाटत नाही. ते टाके ओलांडून पुढे गेल्यावर समोरच एक पठार लागते. त्यावर धान्याचे कोठार आहे. कोठाराच्या मागच्या बाजूने पुढे अजून एक टाके आहे त्यात पंप बसवून गावात पाण्याची सोय केलेली दिसते. इथेच कातळात लपलेले एक टाके असल्याची माहिती होती. हे टाके सहजासहजी कोणाला सापडत नाही. बरेच लोक ते माहितीच नसल्याने न बघताच परत जातात. ते बघायचे होते पण त्याचे अचूक ठिकाण माहिती नसल्याने फोनाफोनी चालू केली. एकतर मला सोडून बाकी कोणाला फार इच्छा असल्यासारखी वाटत नव्हती किंवा मला जाणवत नव्हती. त्यातून मी एकटाच त्यासाठी हट्ट करत असल्यासारखं वाटत होतं. व्यवस्थित पण पटापट बाकी अवशेष बघत एक डोळा त्या टाक्याकडे एकीकडे ठेवून होतो. पुढे एक सोंड गडाच्या शेवटच्या टोकाकडे जाते. विनीतला फोन झाला तेव्हा सोंडेवरून शेवटाकडे न जाता उजवीकडे एक वाट खाली टाक्याकडे उतरत असल्याचे त्याने सांगितलेन. प्रत्यक्षात ती वाट काही सापडत नव्हती सोंडेकडे निघालो तेव्हा उजवीकडे खालच्या बाजूला एक मंदिर दिसले शंकराची पिंड आहे समोर एक नंदी आहे तसंच काही कोरीव दगड आहेत. ते पाहून परत आल्यावर पुढे निघाले की काही सतीचे दगड ठेवलेले दिसतात. पुढे गेलं की सोंडेचे बऱ्यापैकी शेवटचे टोक दिसते. तिथूनही पुढे गडाचा काही भाग शिल्लक आहे परंतु तिथे बघण्यास काही नाही. डावीकडच्या शेवटच्या टोकावर एक ध्वज उभारलेला दिसतो. टाके न सापडल्याने थोड्याश्या निराशेने मी परत फिरलो.
गडावरच्या तोफा
आत्तापर्यंत मी एकटाच त्या टाक्याच्या शोधात होतो आणि तो हट्ट सगळ्यांना कळला होता कदाचित काही जणांना रागही आला असेल अशी मला शक्यता वाटत होती. पण मलाही ते टाके बघायचे होते. शेवटच्या टोकावर नामजोशी काका आधीच पोचलेले होते. त्यांनाही तसे काही दिसले नव्हते. परत फिरताना डावीकडे खालच्या बाजूला एक कपार दिसली. निरखून पाहिल्यावर एक खांब दिसला आणि ते टाके असावे असे वाटले पण तिथे जाण्यास काही मार्ग नव्हता. रोप लावून जावे लागले असते. तसही जे मला शोधायचे होते त्या टाक्यापर्यंत वाट जाते हे मला माहिती होते. बराच फिरल्यावर मग परत येताना मी उरलेले सगळे अवशेष बघितले. ते कोठार, त्या समोर असलेली तोफही बघितली. तिथे एक अर्धवट तुटलेली तोफ शिल्लक आहे. उजवीकडे अजून एक पाण्याचे टाके आहे. जवळजवळ गडफेरी पूर्ण झाली होती. त्या मंदिराजवळचा बालेकिल्ला मात्र बघायचा शिल्लक होता. आता त्यात शिरलो आणि त्यावरून चालत चालत त्याचे चारही बुरुज बघितले. शेवटच्या मंदिराच्या कडील बुरुजावर 3 तोफा रचून ठेवलेल्या आहेत. एका तोफेचे तोंड बरोबर मुख्य दरवाजाकडे आहे. बांधकामाच्या मध्ये चुन्याचा घाणा आहे. सर्वजण मंदिरापर्यंत घेऊन पोहोचले होते गडफेरी पूर्ण झाली होती पण मला ती अपूर्णच वाटत होती. तोफा हे या गडाचे वैशिष्ठ्य. गडावर १६ तोफा असल्याचा उल्लेख आहे. आम्हाला त्यातल्या १५ दिसल्या होत्या.
कातळात लपलेले ४ खांबी टाके
मंदिरात पुजारी आलेला होता. कोणीतरी म्हणाले कि त्यांना माहिती असेल. लगेच त्यांना जाऊन त्या टाक्याचा पत्ता विचारला, त्याने सविस्तर सांगितले. माझ्याबरोबर राहुललाही ते टाके बघायचं होतं. मी ते शोधून दिसते का हे बघतो म्हणून परत निघालो. मागून प्रभू काकाही येत होते. नामजोशी काका आणि अजूनही एकदोन जणही येऊ लागले आता मात्र मला टेन्शन आलं. एकतर मी एकट्यानेच या टाक्याचा मार्ग ऐकला होता, तोही अर्धवट. त्यातून ते टाकं मिळेल की नाही याची खात्री नव्हती. उगाचच पोरं हट्ट करतात म्हणून वडीलधारी मंडळी चिडतील की काय एक शंका मनात होती. भीत भीतच मी आणि राहुल पुढे गेलो. सोंडेचा शेवटच होतो असे वाटले होते तिथुनच पुढे खाली उतरलो. नाही नाही म्हणत भवश्री पण तिथपर्यंत येऊन पोहोचली होती. खाली मात्र कोणीही येऊ नका म्हणून मी आणि राहुल पुढच्या वाटेकडे निघालो. पायवाट थोडी आशा दाखवत होती. वाट उजवीकडे खाली उतरत होती. आम्ही उतरलो, वाट अतिशय घसार्‍याची आहे. या वाटेवरच खाली गेलो आणि उजवीकडे खड्डा दिसला. आशा निर्माण झाली आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचलो. तिथे एक तोफ ठेवलेली आहे आणि चार खांब असलेलं अतिशय सुंदर टाकं आहे. अतिशय आनंदाने सगळ्यांना ते टाकं सापडल्याचं सांगितलं. काही फोटो काढले. तोपर्यंत मालुसरे सर आणि प्रभू सर येऊन पोहोचले. त्यांच्याबरोबर नितीनही होता. तोफ अगदीच कडेला असल्यामुळे आम्ही ती टाक्याजवळ उचलुन ठेवली. टाक्यावर बरच गवत वाढलेलं होतं. तेही साफ केलं. गड फिरल्याचं समाधान मिळालं होतं. परत मंदिराजवळ आलो. सामान आवरलं आणि दहाच्या आतच परतीच्या प्रवासाला लागलो रसाळवाडी फाटा, भरणा नाका, खेड, महाड करत माणगावला पोचलो. पुढे थोडे खाणे झाले. मग मात्र कुठेही थांबा न घेता सरळ पुन्हा हिंजवडी-चिंचवड असं करत स्वारगेटला येउन पोहोचलो. साडेसहा वाजेपर्यंत चक्क मी घरात होतो. माझ्याच जिल्ह्यात असूनसुद्धा मला अपरिचित असे तीन किल्ले बघुन झाले होते.

सुमार-महीपत-रसाळगड: एक भन्नाट भटकंती
रसाळगड, सुमारगड, महीपतगड, पालगड, मंडणगड Rasalgad, Sumargad, Mahipatgad, Paalgad, Mandangad

सह्याद्रीच्या डोंगरवाटा.. इथल्या दऱ्याखोऱ्यातून..पानापांतून..रानोवानातून यत्र-तत्र-सर्वत्र वाहणारा.. खट्याळ मस्तवाल वारा.. अंगावर येणारे कातळकडे.. भटक्या मंडळींचं पार घामटं काढणारी चढण.. अंगाचं सालटं सोलवटणारी एखादी काटेरी झुडूपातील चाल.. मना धडकी भरवणाऱ्या दऱ्या खोऱ्यांचा एक भव्य नजारा.. कुठे डोंगर माथ्यावर बांधलेलं एक छानसं दगडी राउळ.. काळाच्या पटावर धडधडून शांत झालेल्या एका तोफेशी झालेली काही क्षणांची कश्मकश.. कधी अंतर्मुख करून टाकणारी इथली निरव शांतता.. पार वैराग्याची अनुभूती देणारी.. सब मिथ्या है..  हि प्रचीती देणारी.. माणसाच्या तोंडावरचा दुनियादारी चा मुखवटा फाडून त्याला पुन्हा माणसात आणणारी.. स्वत:शी स्वत:ची खरी ओळख करून देणारी हि किरर्र कोरी करकरीत शांतता.. 

तर कधी कुठल्याशा अवघड चढणीवर उर फुटेस्तोवर केलेला त्या श्वासांचा गजर.. रान तुडवून जंगलातून बाहेर पडताच समोर दूर दिसू लागणारा एखाद्या डोंगरावरचा दुर्गमाथा.. आणि कड्या कपारी भर उन्हात दूरवरच्या माथ्यावर बोललेला धावा.. या गडावरून त्या गडावर.. माणसांच्या सैर-भैर जगातून सोडवून आणलेला डोंगरात मुक्त झालेला हा जीव .. जीवाची धडपड करीत केलेली रानातील चाल आणि पाचोळा सळसळून सुंगाट बुंग वेगानं आडवं गेलेलं जनावर.. कधी पायाखालून तर कधी नजरेसमोरून.. एका डोंगराच्या कपारीत सापडलेलं गारेगार करून टाकणारं पाण्याचं टाकं.. उघड्या माळावर कुणा अज्ञात वीर सेनानीची ओबडधोबड समाधी.. एखाद्या सन्यस्त योग्यासारखी.. डोंगरात फुटलेल्या चकवा देणाऱ्या पावट्या.. किरर्र घनदाट निबिड अरण्य आणि या जंगलात बांधलेले स्वराज्याचे पहारेकरी.. दुष्मनाला आव्हान देणारे गडकोट .. इतिहासाच्या घडामोडी काही अपरिचित घटनांचे साक्षीदार.. असे काही आडवाटेवरचे दुर्ग.. हाडाच्या भटक्यांचे खरे मैतर.. तिन तिगडा तो काम तगडा रे.. असे सांगणारे वैभवशाली वनदुर्ग सुमार-महीपत-रसाळगड.. एकदम भन्नाट.. राकट कणखर असे दुर्गशिल्प..



सुमार-महीपत-रसाळ गड
सह्याद्रीतील काही भटकंती या ट्रेडमार्क भटकंती प्रकारात मोडतात.. ढाक ते भीमाशंकर, लोणावळा ते ढा, हरिश्चंद्र ते रतनगड, अलंग-मदन-कुलंग, बामणोली ते रसाळगड, पन्हाळा ते विशाळगड, राजगड ते तोरणा, तोरणा ते रायगड, राजगड ते शिवथरघळ, भोरगिरी ते भीमाशंकर आणि रसाळ-सुमार-महिपतगड.. सुदैवाने आणि कर्मधर्मसंयोगाने यातील शेवटची वगळता काही ट्रेडमार्क भटकंती ९० च्या दशकात करता आल्या तर काही ५-६ वर्षापूर्वी.. रसाळ-सुमार-महीपत मात्र आवाक्याबाहेर वाटत होता.. पण निसर्गाचा अद्वितीय आविष्कार पहायचा असेल तर योग यावा लागतो.. अशीच एक संधी २६ जानेवारी २०१६ च्या लाब्लाचक सुट्ट्यांमध्ये चालून आली.. मुंबईचे दर्दी ट्रेकर उपेंद्र, नितीन भाऊ बच्चन, कट्यार प्रसाद आणि जग्वार दीपक दादा अशी टीम जमली.. एका अजरामर भटकंती साठी.. रसाळ-सुमार-महीपतएका भन्नाट भटकंतीसाठी.. या तिन किल्ल्यांच्या सत्वपरीक्षेतील अवघड पेपर आधी सोडवावा म्हणून नेहमीपेक्षा अगदी उलटा क्रम ठरविला.. सुमार-महीपत-रसाळ.. या त्रिदुर्ग भटकंती २-३ प्रकारे करता येते..

वाटाड्या मार्ग क्र. १: खेड - दहिवली गाव – महिपतगड  वाडी बेलदरा  राया धनगराचा झाप - गुर खिंड – सुमार गड – गुर खिंड  म्हार खिंड  धनगर वसती आणि डोगर माथ्यावरून रसाळ वाडी  आणि किल्ले रसाळगड
वाटाड्या मार्ग क्र. २: खेड  वाडी जैतापूर  महिपतगड  वाडी बेलदरा  राया धनगराचा झाप - गुर खिंड – सुमार गड – गुर खिंड  म्हार खिंड  धनगर वसती आणि डोगर माथ्यावरून रसाळ वाडी  आणि किल्ले रसाळगड
वाटाड्या मार्ग क्र. ३: खेड  वाडी बीड  रसाळ वाडी  किल्ले रसाळगड  रसाळवाडी  समोर च्या डोंगर सोंडेवरून.. धनगरवाडा - म्हार खिंड  खाली उतरून गुर खिंड  सुमारगड  गुर खिंड - राया धनगराचा झाप  डोंगर सोंडेवरून लाईटचा खांब  उजवीकडे महिपतगड पायथा  वाडी बेलदरा  महिपतगड  वाडी जैतापूर..
वाटाड्या मार्ग क्र. ४: खेड  वाडी जैतापूर  गवळ वसती  नागमोडी घाट आणि उजव्या अंगाचा डोंगरमाथा  वर पोचताच  उजवीकडे राया धनगराचा झाप - गुर खिंड – सुमार गड – गुर खिंड  पुन्हा झाप – लाईट खांब – समोर वाडी बेलदरा - महिपतगड  वाडी बेलदरा  वाडी जैतापूर  गाडीने रसाळगड - आणि किल्ले रसाळगड

टीप १: मार्ग क्र. ३ ला जोडून बामणोली-शिंदी मेट-चकदेववाडी बीड मार्गे बामणोली ते महीपतगड असा जम्बो ट्रेक करता येऊ शकेल
टीप २: मार्ग क्र. १ उलट्या क्रमाने केल्यास पुढे हातलोट घाट चढून मधु-मकरंदच्या शिखरांना गवसणी घालता येऊ शकेल

आम्ही मार्ग क्र. ४ निवडला शेवटी कुठल्या ध्येयाचा आनंद हा ते गाठण्याच्या प्रवासात आहे.. प्रजासत्ताक दिनी अनायसे भटकंती योग जुळून आला आणि सुरवात झाली एका अजरामर भटकंती ची.. मुंबई टीमचे संख्याबळ जोरावर असल्याने पुण्याहून मी एकलाच लाल डब्याने निघालो.. स्वारगेट वरून माणगाव ची यष्टी पकडून रात्री दोन च्या सुमारास तिथे एका आरस्पानी स्थानकावर दाखल झालो.. मुंबई टीम चे चालक मालक जग्वार दादा असल्याने.. थकलेली यशवंती (इंडिका कार गाडी) धापा टाकत.. ३ च्या सुमारास माणगावला पोचली.. कार मधून उतरताच दादांनी मिशीवरून कंगवा फिरविला आणि चला चला लाही लेट झालं.. चला चला.. अशी घाई घाई सुरु केली..

मग माणगाव-आंबेत-मंडणगड फाटा.. पालगड फाटा मार्गे पहाटे पाचला खेड स्थानक गाठले,, झुंजूमुंजू होण्याच्या आत.. वाडी जैतापूर गाठायचे असल्याने टाईमपास-३ न करता.. भरणे नाक्यावरील पेट्रोल पंपाच्या डाव्या अंगाने जाणाऱ्या टापोटाप डांबरी सडकेने निघालो.. २०-२२ किमी चा टप्पा पहाटेच्या टायमाला पार करून वाडी जैतापूर आणि पुढे २-३ किमी वर गवलवाडा म्हणजेच धनगरवाडा गाठला इथे या प्रवासतील एक ट्रेडमार्क विहीर आहे.. आणि मागे धनगरांची वसती.. इथून ना सुमारगड दिसतो नं महिपतगड.. डावीकडे एक डोंगर रांग उजवीकडे एक आणि समोर त्या डोंगररांगा एकत्र येताना दिसतात.. या खोऱ्यातून आता गाडीरस्ता काढला आहे.. थेट महीपतगडाच्या अल्याडच्या डोंगरावर जाणारा..

गवळवाड्यातून एक माहितगार ठरविला आणि लगोलग निघालो.. आणि ह्याचं झालं असं कि समदी म्हणत होती नाष्टा करून जाऊ.. पण दादा म्हणले .. “आता लवकर चला उशीर कशाला करता..!!” म्हणून तसेच निघालो.. कच्च्या गाडी रस्त्याने.. साधारण अर्ध्या पाउण तासात एका तासलेल्या डोंगरकड्याशी येऊन थांबलो.. इथे दादा गाडी घेवून हजर होतेच.. आता ज्युनिअर यशवंती ला इथेच सोडून सुमार गडाकडे निघालो.. ब्यागा बोचकी बाचकी घेवून मंडळी बिगीने गडाव निघाली.. इथे सुरवातीलाच तीव्र चढ साधारण शे-दोनशे फुट उंचीचा आणि मग एक भला मोठा डोंगराच्या उजव्या अंगाने वळसे घेत जाणारा सरळसोट ट्राव्हर्स मारून मग उजव्या अंगाने डोंगरावर तिरकस चढणाऱ्या वाटेने निघालो.. इथे मात्र उन्हाने पार हल्ला बोल सुरु केला.. त्यामुळे वेग मंदावला होता.. पण जग्वार दादा काही लीड पोझिशन सोडायला तयार नव्हते.. साधारण तासाभरात डोंगरमाथा गाठला आणि आपण बरीच उंची गाठल्याचे लक्षात आले.. आता समोर.. डावीकडे.. महिपतगड.. पायथ्याची वाडी बेलदार अगदी डौलदार दिसू लागली.. सुमारचा काही माग लागेना.. इथे धापा टाकीत बूड टेकवणार इतक्यात दादा वदले.. “आता लवकर चला उशीर का करता..!!”.. मग दादांशी नष्टर घेवून १० मिनिटांचा ब्रेक घेवून टाकला.. म्हटलं हृदयाचे ठोक्यांची हि तेजतर्रार धडधड शांत होईस्तोवर नाही हलणार कोणी..

या डोंगर माथ्यावर आल्यावर.. समोर एक डोंगर रांग दिसते.. पायथ्याशी एक टुमदार वाडी २०-२५ घरांची.. समोर आखीव रेखिव शेताड.. मध्ये दरी खोरं.. दोन भल्या थोरल्या डोंगररांगांना समांतराचे अस्तित्व देणारं.. यातील  अलीकडची एक डोंगररांग.. एखाद्या स्पीड ब्रेकर सारखी.. रांगेकडे पाहिल्यास उजवीकडे कोकणचा दरीचा नजारा..

गवलवाडा ते इथवर यायला साधारण दीड-दोन तास वेळ लागतो.. क्षणभर विश्रांती घेवून आता सुमारगडाकडे निघालो.. गाईड --- तयारच होते.. आणि सोबत चला चला.. लवकर चला असा पिच्छा पुरवणारे आमचे दादा. तर दादांच्या विनंतीला मान देवून निघालो .. आता दुपारच्या उन्हाचा मारा थोडा तीव्र होऊ पाहत होता.. पण आजवरच्या भटकंतीचा अनुभव पाहून मध्यम वेगाने चाल सुरु ठेवली.. पहिली चढण चढताच उजव्या अंगाच्या डोंगर उतारावर एक सत्तरीतले म्हातारबाबा उन्हं खात बसले होते.. “कुठून आला पोरांनो.. आणि कुठंशी जाणार?”.. अशी विचारपूस सुरु झाली.. सुमारला चाललोय.. “वाट वाईच अवघड हाय पन.. नीट जावा”.. मी हाय इथं गुरं सोडल्यात तवा थांबतो इथं.. बाबा तुमचं नाव.. “राया.. राया धनगर..” इथं वर एकलाच राह्यतो.. सत्तरीतला हा माणूस आता एखाद्या योगसंपन्न सन्याशासारखा भासू लागला.. रानाची पाखरे अशी रानातच रमायची.. यांना मायानगरी कशी रुचावी.. दूरवर पसरलेला हा सह्याद्रीचा पसारा आणि किर्र अंधारल्या रानात एक खोपटं बांधून एकटाच राहणारा हा राया.. म्हणजे जशी प्रभूची थोर माया.. राया.. म्हणजे ह्या दूरवरच्या रानाचा एक अनामिक राजा.. इथल्या निसर्गरम्य आटपाट नगरीत एखाद्या महालासारखं एक टुमदार खोपटं बांधून राहणारा एक धाडसी सैलानी.. इथली झाडे.. फुलं वेली पाने.. इथे नांदणारी हिंस्त्र श्वापदे.. सरपटणारे जीव.. आणि आकाशात मुक्त विहरणारी पक्षी.. हि त्याची प्रजा.. आणि राया त्यांचा अनभिक्षित राजा.. एक सन्यस्त जीव..



राया धनगराचा अनुभवाचा आणि आपुलकीचा ‘नीट जा रे पोरांनो’ असा कानमंत्र घेवून पुढे निघालो.. एक दोन उंटाच्या पाठीसारखे चढाव पार करीत साधारण अर्ध्या तासात राया धनगराचा झाप’ गाठला.. इथे राया धनगराच्या झापामध्ये ब्यागा ठेवून केवळ पाण्याच्या बाटल्या आणि शिदोरी घेवून पुढे निघालो.. जग्वार दिपकदादा तयारच होते.. “चला चला.. लवकर चला

आता झाडी जंगलातली वाट होती.. राया धनगराच्या झापापासून पुढे जायचं.. डोंगराला डावीकडून वळसा मारीत.. तब्बल तिन डोंगरांना वळसा मारताना इथले घनदाट जंगल आणि त्यातून जाणारी पाला पाचोल्याची वाट सोबतीला असते.. अधून मधून जाणवणारी सळसळ कधी डोक्यावर सांदी-पानातून होणारी तर कधी पायवाटेच्या डाव्या उजव्या अंगाच्या दाट झाडीत जाणवणारी.. आणि रान तुडवताना होणारा चर्र फर्र असा आवाज सारेच विलक्षण.. श्वासांची  लय वाढू लागली तसे ब्रेक ब्रेक असे आपसूकच ओरडू लागलो पण दादा काही ऐकेचना.. त्यांच्या अंगात जग्वार संचारला जणू.. फ्या फ्या करीत गप गुमान दादांच्या मागे मुकाट पावले टाकू लागलो..

साधारण तासभर’ चालीनंतर वाट तिरपी वर जाऊ लागली.. गचपणीच्या वाटेने पुढे जाताच आपण एका मातकटलेल्या खिंडीत येऊन पोहोचतो.. हि ‘गुर खिंड’.. इथून समोर उतरणारी वाट.. रसाळकडे म्हार खिंडीकडे जाणारी तर डावीकडे वर जाणारी कारवीच्या झाडीतली वाट सुमारगडाची.. इथे खिंडीत जोरदार ब्रेक देण्याचे दादांनी मान्य केले होते म्हणून हक्काचा ब्रेक घेवून कारवीचे रान तुडवून वर जाऊ लागलो.. डोंगरकड्याला उजवीकडे ठेवत तिरपे सरळ जाताच एक भलेमोठे झाड वाटेला आडवे आले.. गुरे-ढोरे पुढे जाऊ नयेत म्हणून हा ओंडका पायवाटेला आडवा  टाकून वाट बंद करण्यात आली असल्याचे दिसले.. अरेच्चा !! पण आपण तर माणूस .. म्हणून हा ओंडका लांघून पल्याड जायचे आणि चाल सुरु ठेवायची .. दहा पंधरा मिनिटात सुमार गड समोर उन्हात तळपताना दिसू लागतो आणि पावलांचा वेग आपसूक वाढू लागतो.. गड समोर पुढ्यात आला कि तिथवर पोहोचण्यासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागतात. दिवसातलं पहिलं ध्येय असं भर उन्हात आणि तळपत्या रानात पुढ्यात येऊन ठेपलं.. पावले आपसूकच गडमाथ्याकडे निघाली.. दहा-एक मिनिटात सुमारगडाच्या नाकाखाली पोहोचलो.. इथे येताना डावीकडे सह्याद्रीचा एक आणखी एक अजरामर नजारा आणि सह्याद्रीची भेदकता दर्शविणारा एक नजारा काही केल्या डोळ्यासमोरून हलत नसतो.. कातळ  तुटून कोसळत्या दऱ्या.. खाली दोन डोंगर रांगांच्या मधोमध घनदाट वृक्षराजीने वेढलेले खोरे सारेच अद्भुत.. पंडोराचे जग.. भव्य दिव्य राकट कणखर..

सुमारगड आणि त्याच्या अलीकडचा डोंगर एका निमुळत्या धारेने जोडला आहे..  सुमारगडाच्या तिनही बाजूनी खोलवर दिसणारी दरी काळजात कापरे भरते.. तेंव्हा जपून धिम्याने चालत पुढे निघालो.. सुमारगडाला डावीकडून प्रदक्षिणा मारताना पायाखाली जेमतेम दोन तिन फुटाची कातळात कोरलेली वाट साथ देत असते उजवीकडे थेट डोक्यावर उभा कातळ.. त्याचा आधार घेत डावीकडे दिसणारी दरीकडे न पाहता पुढे निघायचं.. दृष्टीभय चेपून चाल सुरु ठेवायची.. आता आपण गडाच्या पलीकडच्या कोपर्यापाशी येऊन पोहोचतो.. इथे बऱ्यापैकी झाडी आहे आणि थोडं पुढे थेट दरी चे सैराट दर्शन.. नजर हटी.. अन दुर्घटना घटी.. सुमारगडाची वाट संपून आता प्रस्तरारोहन सुरु होते.. तेंव्हा क्षणाची उसंत घ्यायची आणि थेट कातालाशी दोन हात करायचे.. आता सुमारच्या नाकावरून प्रस्तरारोहण करीत कातळखोबणीतून वर सरकायचं आणि तुटक्या फुटक्या पायऱ्यांनी वर येताच.. साधारण साठ-सत्तर फुट उंच आणि ७० अंश तीव्र अशा कड्यावर वर जाण्यासाठी एक तुटकी फुटकी शिडी आहे.. इथे एक चूक थेट जीवावर बेतू शकते तेंव्हा दमाने वर निघायचं.. शिडी ज्या कड्यावर लावली आहे तिथे बऱ्यापैकी घसारा आहे.. कधी कधी तर थेट एखादा दगड आधाराला धरायचा आणि तो थेट हातात येऊन पडतो.. याला शास्त्रीय भाषेत लूज-रॉक असं म्हणतात.. लूज-रॉक शी दोन हात करून शिडीच्या वरच्या टोकावर पोचताच.. एक तिरपा खडक आहे आणि उजवीकडे थेट दरी.. इथे एक झाड आहे.. सुरक्षेसाठी इथे दोर लावता येऊ शकेल.. लटपट करणारी शिडी आणि विनाखोबणीचा खडक पाहून पावलं अडखळली.. तिरप्या खडकावर ग्रीप नसल्याने उभं राहण्याचे धारिष्ट्य होईना.. तसा पुन्हा शिडी उतरून खाली आलो.. उप्या.. नितीन भाऊ आणि गाईड सरसर वर गेले मी तिथेच एका दगडावर जीव मुठीत घेवून बसलो.. वर जाऊन भाऊंनी एका थोरल्या झाडाला दोर बांधला आणि मग पुन्हा एकदा प्रयत्न म्हणून जीव खाऊन चाल केली.. सोबतच्या दोराच्या आधाराने तिरप्या खडकावर पाय ठेवला.. आणि डावीकडच्या -१० फुटी कातळटप्पा चढून खोबणीतून वर सरकत एकदाचं ते झाड गाठलं.. इथे गडाची तटबंदी दिसू लागली खाली जेमतेम -५ फुटांचा जमिनीचा पट्टा.. आता छातीइतक्या तटबंदीवर जोर लावून चढायचं आणि गडमाथ्यावर प्रवेश करायचा..

इथे झाडाच्या सावलीत एक जोरदार ब्रेक घेवून श्वासांची एक्स्प्रेस तटबंदीवर लावली.. आणि गडावर काय काय अवशेष उरले आहेत हे पाहण्यासाठी निघालो.. समोरच एक देवडी आणि भग्न देवता दिसताच नतमस्तक होवून डाव्या अंगाने निघालो.. आता इथे उजवीकडे पाण्याचं एक मोठं टाकं आहे आणि डाव्या बाजूच्या कातळात गुहेमध्ये शंभूमहादेवाचे मंदिर.. हिरव्याशार पाण्याचा तवंग बाजूला सारून बघितलं तर पाणी अगदी स्वच्छ होतं.. आणि थंडगार.. मग पोटभर पाणी पिऊन शंभू महादेवाचं दर्शन घेवून भर उन्हात एक गडावर प्रदक्षिणा मारली आणि पुन्हा ऊरात धडकी भरवणाऱ्या वाटेकडे निघालो.. परतीच्या प्रवासाला.. आता खरी कसोटी होती.. दरीची खोली आणि त्यातून निर्माण होणारे दृष्टीभय पायात कापरे भरत होते.. मग स्लो बट स्टेडी हे ब्रीद मानून.. घसारा उतरू लागलो.. वाट तशीच होती.. नजर हटी आणि दुर्घटना घटी.. दोरखंडाला ठराविक अंतरावर गाठी मारल्याने आधार भक्कम होता.. जीव खाऊन दोर पकडून हि वाट उतरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला.. वन पीस.. एकही टप्पा न पडता सुखरूप खाली उतरल्याने गडदेवतेचे आभार मानले आणि पुन्हा परतीच्या वाटेकडे निघालो.. ३ डोंगरांना उजव्या अंगाने वळसा मारीत पुन्हा राया धनगराच्या झापावर येऊन पोचलो.. तेंव्हा राया धनगर दुपारच्या विसाव्याला त्याच्या खोपटात परत आला होता.. मग पायपीटीने तापलेल्या देहरुपी इंजिनावर एक हंडा ताकाचा मारा केला.. तेंव्हा जीवात जीव आला.. तिथे एका झाडाखाली बूड टेकवले आणि जग्वार दादांना तंबी दिली गाडी अर्धा-पाउण तास काही हलणार नाही.. एक हंडा ताकाने एकदम अंगात शक्ति फुंकल्याने.. ताजे तवाने होऊन.. वाडी बेलदार कडे निघालो.. पन्ह आल्यावाटेने.. लाईटच्या खांबापाशी येऊन पोचलो.. इथे अलीकडे एका वाट खाली उतरते.. थोडं दरीत उतरायचं आणि पुन्हा छाताडावर येणारा चढ पार करताच कौलारू घरांची टुमदार वाडी दिसू लागते.. हिच ती बेलदार वाडी.. वाडीच्या डावीकडे वर थोरला आडवा डोंगर म्हणजे महिपालगड..

मुक्काम पोष्ट बेलदार वाडी:-


बेलदार वाडीच्या अलीकडे पोचलो तोवर सूर्यदेव चंबू गबाळे आवरून दुसऱ्या गावी निघाले होते.. वाडीत पोचलो आणि दुसऱ्या घराशी येऊन पोचलो.. इकडे पवार आजी स्वागतासाठी बाहेर आल्या.. कुठनं आला पोरांनो.. या जरा विसावा घ्या.. मग चार-दोन गप्पा मारल्यावर.. जेवणाची सोय होईल का हे विचारले.. तुमी काही तेल बिल आणलंय का.. हो आणलंय नं.. तांदूळ.. तेल मीठ चहा.. सगळा शिधा आहे.. मग देते बनवून.. तुम्ही बसा.. पाणी भरून आलेच मी.. म्हणजे.. हिथं पाणी ते वरच्या विहिरीतून आणवं लागतं.. मग उप्या म्हणाला.. आजी तुम्ही थांबा आम्ही भरतो पाणी आज.. मग चार दोन हंडे आणि एक पोहरा घेवून.. निघालो पाणी भरायला..
गावातून मधोमध आडवी जाणारी वाट ५-६ घर संपताच एका टेकाडाला वळसा घालून नागमोडी वर जाऊ लागते.. इथे खुरटी झाडी आणि मग एक ओढ आहे.. इथेच एक विहीर आहे.. हाच इथल्या पाण्याचा मुख्य स्त्रोत.. पोह्र्याने पाणी शेंदून.. पुन्हा पवार आजींच्या घराशी येऊन पोचलो.. आम्ही पाणी भरल्याचे आजींना भारी कौतुक.. म्हणून त्यांना भेटलेल्या प्रत्येकाला त्यांनी आवर्जून सांगितले.. पोरांनी पाणी भरलं सगळं.. मला किती मदत केली.. मस्त बटाटा भाजी आणि तांदळाची भाकरी असा जय्यत मेनू होता.. आजीच्या त्या चंद्रमौळी झोपडीच्या पवीत ब्यागा टेकवल्या होत्या.. जेवण तयार होताच आजीने आरोळी दिली तसेच भुकेने कावलेले जीव जेवणावर तुटून पडले.. मग गप्पा फोडणीला.. तेंचा आजींचा परिवार आता मुंबईत स्थाईक झाला ते.. “आजी गाव तसं मोठं दिसतंय”,, ,, किती लोक राहतात इकडं वसतीला.. कशाच काय.. आता सगळे गेले पोटापाण्याच्या वाटेला.. आता फक्त हिथं मढीच राहिली नं काय.. या वाक्याने खोलीत शांतता पसरली.. आडवाटेवर वसलेल्या या वाडीसत्याची हिच खरी कर्मकहाणी.. रोज संघर्ष करण्यापेक्षा जरा इतरांसारखं जगता यावं म्हणून इथली नवीन पिढी शहरात किंवा पायथ्याच्या गावी स्थलांतरित झालेली.. आणि मागे उरलेली हि जुनी पिढी.. शहरी वातावरणाशी सूत नं जमवता आलेली.. इथली भाबडी लोकं.. इथल्या मातीत जन्मलेली आणि इथेच मिसळून जाणारी..

आजी सगळ्याचं जेवण होईपर्यंत थांबल्या होत्या.. कुणाला कमी पडाय नको म्हणून.. दादांनी आग्रह केला मावशे घे वाढून पान आता.. झालय आमचं..! ना आमची कुठली ओळखना पाळख.. पण केव्हढा हा जिव्हाळा.. आणि केवढी डोंगराएवढी आपुलकी.. अशी हि रानातली मुक्त पाखरे रानातच रमायची.. त्यांना हा नवा बाटलेला शहरी वारा कसा सोसावा..!! जेवण उरकून पुन्हा पवीत येऊन पोचलो.. डोंगरा आडून वर आलेला चंद्र आता.. पडवीच्या झावळ्यातून डोकावत होता.. सारवलेल्या अंगणात पाठ टेकली आणि पाच दहा मिनिटात दिव्य समाधी लागावी तशी गाढ झोप लागली.. एक शांत झोप..

किल्ले महिपतगड: सकाळी जग्वार दादांच्या आवाजाने जाग आली.. चला दादा.. महीपतगडावर.. सकाळी लवकर गडप्रदक्षिणा करून आज रसाळगड  पहायचे ठरल्याने.. सगळ्यांनी आवरते घेतले.. ब्यागा आजीकडे सोडून लगोलग महीपतगडाच्या वाटेवर निघालो.. ते तिकडं.. वाटेवर आड (विहीर) हाय.. तिथनं डावीकडं वाट गेली गडावर.. सापडल वाट तुमाला.. नीट जा..

बेलदार वाडीतून जाणाऱ्या वाटेने डावीकडे जायचं.. मग अंदाजे शंभर पावलावर वाट उजवीकडे वळते.. खुरट्या झाडीतून दहा-पंधरा मिनिटे चालून आपण त्या विहिरीपाशी येतो.. इथे डावीकडे डोंगराच्या नाकाडावर/सोंडेवर नेणारी वाट आहे.. या नाकावर चढून आपण डोंगराच्या खाली येतो.. इथे डावीकडे.. एका जोड-डोंगरावर लांब नाकासमोर महीपतगडाचा बुरुज दिसू लागतो.. पायवाट उजवीकडे वळणे घेत महीपतगडाच्या दिशेने जावू लागते.. इथे उजवीकडे एक वाट वर जाताना दिसते आणि एक डावीकडच्या बुरुजाकडे जाणारी.. आपल्याला उजवीकडे वर जाताच.. एक आडवी भिंत दिसते.. हा क बंधारा आहे.. भिंतीच्या डावीकडून वर येताच.. पायवाटेने पुढे सरकायचं.. पुढे उजवीकडे एक मोठी विहीर दिसते.. विहिरीच्या अलीकडे थोडी मोकळी जागा  आणि मागे दाट झाडी-जंगल आहे.. विहिरीला खेटून गवतातून जाणाऱ्या बारक्या वाटेने पुढे आडवी झाडी दिसते.. हि पार करताच एक प्रशस्त मळलेली पायवाट दिसते.. हि आपल्याला पारेश्वर मंदिराकडे घेवून जाते.. या वाटेने झाडीतून जाताच.. दहा-पंधरा मिनिटात मंदिर दिसू लागले.. मंदिरासमोर एक विहीर आणि बरीच मोकळी जागा.. बाकी अथ:पासून इतिपर्यंत जंगलच-जंगल.. इथे अस्वल.. कोल्हे.. बिबटे आणि जंगली प्राण्यांचा मुक्त वावर आहे.. त्यामुळे इथल्या गडावरच्या जंगलात मुक्काम करीत असाल तर सावधान..

महीपतगडाचा पसारा तसा बराच मोठा आहे.. पण गडावर सध्या दाट जंगल असल्याने .. बरेच अवशेष अक्षरशः शोधावे लागतात.. इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार गडाला ६ दरवाजे आहेत.. ईशान्य दिशेला लालदेवडी दरवाजाआग्नेय दिशेस यशवंत दरवाजा, पूर्वेला पुसाटी,  पश्चिमेला शिवगंगादक्षिण दिशेस खेड आणि उत्तरे कोतवाल दरवाजा अशी नावे आहेत.. गडावर मध्यभागी पारेश्वराचे मंदिर आहे..  खेड दरवाजा जवळ गणपती आणि मारुती मंदिर आहे.. महिपतगड सुमारे सव्वाशे-दिडशे एकरात पसरल्याचे इतिहासकार सांगतात..पण गडाचा पसारा खरंच खूप मोठा आहे.. संपूर्ण गड धुंडाळायचा आणि काना-कोपरा पहायचा म्हणजे कमीत कमी - दिवस हवेत.. गचपण असल्याने बऱ्याच ठिकाणी पायवाटा नाहीत.. वाट करीत जावे लागते आणि स्थानिक सोबत असल्याखेरीज हे धाडस करून नये.. असं घनगर्द जंगल इथे आहे..

महिपतगड हा सह्याद्री रांगेला समांतर जाणाऱ्या अशा डोंगररांगेवर बांधला आहे.. याच रांगेत .. सुमारगड आणि पुढे डावीकडे रसाळगड हे किल्ले येतात.. किल्ल्यावरून उतरून हातलोट गावी जाता येते.. इथून हातलोट घाटातून मधु मकरंदगडाकडे जाता येईल.. किंवा रसाळगड उतरून चकदेव-महीमंडण-पर्बतगड कडेही जाता येते.. गडावर ३६० ते ७०० इतिहासकालीन अवशेष असल्याचे इतिहासकार आणि ग्याझेटीअर्स सांगतात.. यात लहान मोठे बुरुज.. वाडे.. समाधी.. मंदिरे आणि तटबंदी यांचा समावेश आहे.. रामदास स्वामींच्या सज्जनगड वास्तव्याआधी या गडाची निवड केल्याचे काही इतिहासकारांचे मत आहे.. असो..

आम्ही मंदिरासमोर डावीकडे दिसणाऱ्या चौथरयाकडे निघालो.. इथून एका अज्ञात समाधीलगतची वाट झाडीत गेल्याचे दिसले.. तिकडे निघालो.. पुढे गचपण वाढू लागली तसे.. ऊन दिसेनासे झाले आणि पायवाटेवर डावीकडे एक उघड्यावरचे हनुमान मंदिर आहे.. इथून उजवीकडे जाताच.. दाट वाटेने आपण बाहेर येताच एक ओढा दिसतो.. हा पार करताच परत दाट जंगल.. इथे थोडी चढण आहे.. पण डावीकडे जाणारी.. दाट जंगलातली.. दिड पुरुष भर उंचीच्या कारवीमधली.. हि कारवी पार करताच वाट आपल्याला एका सोंडेवर घेवून जाते.. इथे जंगल मागे पडून आपण एका डोंगराच्या सोंडेवर (पूर्व दिशेस) येऊन पोचतो.. समोर दरी.. पुढे सह्याद्रीच्या दोन-तिन समांतर आणि अजस्त्र डोंगररांगा.. तुटलेले कडे.. खाली दरीत घनदाट जंगल दिसते.. इथून पाहताना उजवीकडे चौथ्या डोंगररांगेत मधु-मकरंदगड डोकं वर काढून बसल्याचे दिसतात.. डावीकडे महीपतगडाचा पसारा दिसतो.. त्याच्या शेवटाला एक सोंड खाली उतरते.. ती पुढे खिंडीत आणि डावीकडे --- गावात जाते.. अलीकडे गर्द जंगल आहे..

हि सोंड थोडी निमुळती होत खाली उतरते.. इथे बऱ्यापैकी जागा आहे.. इथून डावीकडे पाहताना.. महीपतगडाच्या डोंगर उताराला बांधलेले ३-४ बुरुज दाट झाडीतून बाहेर डोकावताना दिसतात.. सह्याद्री चे विश्वरूप दर्शन दाखवणाऱ्या काही अद्भुत जागांपैकी हि एक दिव्य जागा आहे.. हे नक्की.. असो सह्याद्री चा दिव्य नजारा पाहून पुन्हा पारेश्वर मादिरापाशी आलो.. आणि एक पाणी ब्रेक घेवून पुन्हा बेलदारवाडीपाशी आलो.. इथे पवार आजींचा निरोप घेवून पायथ्याच्या धनगरवाडी कडे निघालो.. इकडे बांधाला आडवे जात मग डोंगराच्या कडेने समोरच्या सोंडेवर पोचलो आणि उजव्या उतरत्या पायवाटेने खाली आणि मग पुन्हा डोंगराला डावीकडून अर्ध प्रदक्षिणा मारून आणखी एका सोंडेवर पोचलो.. इथे मुरमाड वाटेवरून धिम्याने उतराई करीत.. घाटरस्ता गाठला..

किल्ले रसाळगड :- दुपारी ३ च्या सुमारास रसाळगडाकडे कूच केली.. रसाळगडावर आता थेट पायथ्यापर्यंत गाडी जात असल्याने गाडीने रसाळगड करायचे ठरले.. गाडी फुफाटा उडवीत निघाली.. आणि १९९२ साली केलेल्या बामणोली रसाळगड भटकंती ची क्षणचित्रे डोळ्यासमोर नाचून गेली.. बामणोली-शिंदी मेट-चकदेवगड-शिडीची वाट-धनगरवाडा-आंबिवली-रसाळवाडी-रसाळगड असा ३ दिवसांचा मेगा ट्रेक एकदम नजरेसमोर तरळून गेला.. खेड-भरणेनाका-तळे गाव पुढे पहिला फाटा रसाळगडकडे जाणारा तर दुसरा उजवीकडचा फाटा-वाडी जैतापूर महीपत-सुमारगडाकडे जाणारा..

वाडी जैतापूर कडून सोडल्यावर तळे गावाच्या अलीकडे डावीकडे एक गाडीरस्ता आहे.. फाट्यावर किल्ले रसाळगड असा फलक लावला आहे.. तिकडे निघालो.. ड्रायव्हिंग चे सुकाणू जग्वार दादांकडे होते आणि गाडी रसाळगड च्या घाट रस्त्यावर कुरकुर करू लागली.. आणि एका वळणावर बेसिक सुविधांवर चालू असलेली दादांची लाजवंती गाडी.. लाजून बंद पडली.... म्हटलं झाली का शाळा आता.. काय दादा..!! तेंव्हा लगेच दादांनी गाडी सुरु करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु केले.. गाडीने एयर पकडलाय.. थांबा जरा.. २-३ वेळा धक्का स्टार्ट करून लाजवंती सुरु झाली आणि जीव भांड्यात पडला.. पुन्हा गाडी फुफाटा उडवीत निघाली.. २-२.३० च्या दरम्यान.. रसाळगडच्या अगदी पायथ्यापर्यंत गाडी येऊन पोचली आणि रसाळडाकडे पावले पडू लागली.. एक चढण पार करून डोंगर सोंडेवर पोचलो आणि पलीकडच्या अंगाला खाली धारेवर रसाळवाडी दिसू लागली.. रसाळगड साधारण दक्षिण-उत्तर असा पसरला आहे.
उजवीकडे रसाळगडाच्या पायऱ्या सुरु होताच.. जय भवानी जय शिवाजी असा एकच जयघोष आणि नुकत्याच बांधलेल्या पायऱ्यांवरून पुढे जात रसाळगडाचे दोन दरवाजे पार करून गडमाथा गाठला.. स्वागताला काही तोफा पाहताच मन आनंदाने भरून गेले.. शेजारीच जंगली बोरांचा सडा पडल्याचे पाहून रानाची बोरे खिशात भरून झोलाईदेवी मंदिराकडे निघालो.. पाच दहा मिनिटात मंदिरासमोर पोचलो आणि गडप्रदक्षिणा मारण्यासाठी निघालो.. गडाच्या दक्षिण बाजूकडील टोकाला.. झोलाई मंदीराला खेटून गडाचा बालेकिल्ला आहे.. त्यासमोरील वाट आपल्याला माचीकडे घेवून जाते.. साधारण अर्ध्या किमीवर पसरलेली हि माची पाहणे म्हणजे एक पर्वणी आहे.. जाताना पाण्याची टाकी.. एक वाडा.. आणि अज्ञात वीरांच्या समाध्या दिसतात.. त्या इतिहासाच्या पटावर धराशायी पडलेल्या वीरांच्या समाधीसमोर नतमस्तक होवून पुढे निघालो आणि वीस एक मिनिटात दक्षिण तटावर येऊन पोचलो.. इथून एक सोंड खाली उतरते.. डावीकडे एक डोंगर त्या सोंडेला खेटून उभा असतो.. जरासा अलिप्त.. उजवीकडे दाट जंगल आणि सह्याद्रीच्या डोंगरांचे पदर.. डावीकडे सह्याद्रीचा घाटमाथा.. चकदेव गड दिसू लागतो.. थोडं मागे सुमारगड दोन डोंगरांच्या मागून डोकावून लागतो.. खाली.. सह्याद्रीची मुख्य रांग आणि रस्ल्गड यांच्या मध्ये --- गाव दिसू लागते.. इथून गडाच्या पायथ्याशी वसलेल्या रसाळवाडीकडे येण्याचा जुनी पायवाट आहे..

सूर्य मावळतीला निघाला तसे गडाचे हे दक्षिण रंग अनुभवून परतीच्या वाटेवर निघालो.. पुन्हा झोलाई मंदिर.. आणि अलीकडे बालेकिल्ला पाहण्यास निघालो.. बालेकिल्ल्याची बरीच डागडुजी केल्याचे पाहून बरे वाटले.. आत खोल्या काही तोफा आणि चुण्याचा घाणा आहे.. बालेकिल्ल्याचे बुरुज मात्र सुस्तिथीत आहेत.. बालेकिल्ला आणि झोलाईदेवी मंदिर यामध्ये असलेला तलाव पुन्हा बांधून काढला आहे.. झोलाईदेवीचे दर्शन घेवून रसाळ-सुमार-महीपत भटकंती देवीच्या चरणी अर्पण केली आणि मनोभावे नमस्कार करून डावीकडच्या तटबंदीवरून फेरफटका मारत पुन्हा खाली  पहिल्या दरवाजाजवळ पोहोचलो.. सोंडेवरून डावीकडे उतरून गाडीरस्ता गाठला आणि सह्याद्रीच्या डोंगरधारेवर सोनसळी किरणाचा अभूषेक करणाऱ्या सूर्याचे ते रुपडे काही क्षण पाहून.. दापोलीला निघालो.. रसाळ-सुमार भटकंती.. हि खर्या अर्थाने पूर्ण झाली होती.. एक स्वप्न पूर्ण झाले होते.. आता दापोली आणि वेळ मिळाल्यास पालगड-मंडणगड करण्याचे ठरले होते..



किल्ले पालगड
दापोली/खेड-मंडणगड रस्त्यावर दापोलीपासून २० किमी अंतरावर पालगड गाव आहे.. पालगड हे सानेगुरुजींचे जन्मगाव.. तिथे मंडणगड - दापोली – खेड तिठा आहे खेड च्या रस्त्याला जायचं थोडं पुढे घाट उतरून गेल्यावर.. दुसऱ्या फाट्यावर डावीकडे वळायच.. हा रस्ता घेरा पालगड कडे जातो.. इथून पुढे ४-५ किमी वर आणखी एक तिठा लागतो.. या ति रस्त्यांच्या मधला रस्ता घेरा पालगड कडे जातो.. घेरा पालगड हे पालगड पायथ्याचे गाव.. ३०-४० घरांचे एक टुमदार गाव.. गावातून गडाकडे पाहताना.. उजवीकडच्या सोंडेवर जाण्यासाठी कच्चा गाडीरस्ता तयार झाला आहे.. या रस्त्याने एक धाधन पार करताच अलीकडे एक पायवाट आपल्याला गडाच्या डावीकडच्या सोंडेवर घेवून चोरदरवाजाकडे जाते.. आणि गाडीरस्ता संपतो तिथून डावीकडे पालगडाचा मुख्य दरवाजा आहे.. जग्वार दादा वाटाड्या यांनी चोर दरवाजाची वाट निवडली.. थोडी चढण पार करताच एका दांडावर पोचलो उजवीकडे येताच.. समोर पालगड दिसू लागला.. पण इकडे सगळ्या गुरांच्या वाटा असल्याने त्यातल्या त्यात मळलेल्या पायवाटेने पुढे निघालो.. हि वाट पालगडाला डावीकडून प्रदक्षिणा घालत दाट झाडीत शिरते.. अगदी अलीकडे एक बऱ्यापैकी मोठे झाड आहे.. त्याशेजारी काही पाण्याचे खोदीव टाके दिसतात.. गचपण वाटेने पुढे जात आम्ही गडाच्या डावीकडच्या बुरुजाच्या खाली येऊन पोचलो.. पण इथे ठळक पायवाट नसल्याने.. पुन्हा माघारी फिरलो.. पुन्हा मोठे झाड दिसताच त्याच्या सावलीत दोन क्षण विश्रांती घेतली.. आणि २० एक पावले पुढे आलो.. इथे एक वाट घसाऱ्यावरून वर झाडीकडे जाताना दिसते.. दादांना म्हटलं चला इथून.. बघा वाट सापडते का.. वर चढून जाताच काहीशी पुसट पायवाट दिसते.. आणि कातळ टप्पा.. या टप्प्यावर बऱ्याच खोबणी असल्याने.. चढाई सोपी आहे.. कातळटप्पा चढून गेलं कि आपण एका ढासळलेल्या बुरुजाच्या समोर येऊन पोचतो.. आता सोंडेवरून बुरुजाकडे जायचं आणि मग उजवीकडे जाताच एक चोर दरवाजा दिसू लागतो.. तिकडे निघालो.. इथे जरा जपून चढायचं.. कारण.. खाली पाय घसरला कि कपाळमोक्ष.. चोर दरवाजा गाठला आणि वर आलो कि काही पायऱ्या पार करताच आपण थेट गडमाथा गाठतो.. खुश्कीच्या मार्गाने का होईना पण गडावर सुखरूप आणल्या बद्दल जग्वार दादांचे आभार मानले.. गडप्रदक्षिणा मारावी म्हणून तटबंदीच्या कडेकडेने निघालो मध्ये काही जोती.. तोफा आणि वाड्याचे अवशेष दिसतात.. गडाची तटबंदी बऱ्यापैकी सुस्थितीत आल्याचे पाहून बरे वाटते.. डावीकडून तटबंदीला समांतर जात आपण गडाच्या तिसऱ्या माचीवर पोचतो.. इथे समोर चा जोड डोंगर आणि त्याची सोंड दिसते.. मागे कोकणचा दूरवर पसरलेला मुलुख.. मध्ये एका सिमेंटच्या चौथरा आणि पत्र्याचे शेड बांधले आहे.. त्यात शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवलेला आहे.. महाराजांना वंदन केले आणि शेडमध्ये काही काळ विश्रांती घेतली.. ऊन जास्तच काऊ लागल्याने.. दहा एक मिनटात मुख्य दरवाजाकडे डाव्या पायवाटेने निघालो.. ढासळलेल्या दरवाजातून खाली उतरताच कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात आणि मग उतरणीची पायवाट.. पालगडाचा निरोप घेतला आणि घेरा पालगड गावाकडे निघालो.. दहा-एक मिनिटात गाडीरस्ता सुरु झाला आणि कच्च्या रस्ताने चालत गाव गाठलं.. हि वाट चोरदरवाजाच्या वाटेपेक्षा फार सहज-सोपी अशी आहे.. घेरा-पालगड गावात एक पाणी ब्रेक घेतला.. आणि एका घरात चहाची सोय लावली.. आणि भाऊंनी (आ. रामदास कदमांनी) गावाचा कसा विकास केला याची कहाणी ऐकली.. गडाबद्दल फारशी माहिती मिळाली नाही पण छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या गडावर येऊन गेल्याचे मात्र एका आजींनी सांगितले.. यजमानांचा निरोप घेवून पुन्हा पालगड-तिठा आणि मग सध्याचे पालगड गाव गाठले.. आणि मंडणगडाकडे निघालो..
मंडणगड किल्ला
पालगड पासून ३०-३५ किमी वर मंडणगड हे तालुक्याचे गाव आहे.. मंडणगड-तिठा येताच डावीकडे जायचं.. आणि यस्टी स्थानकाला खेटून सरळ पुढे जाणाऱ्या गाडी रस्त्याने निघायचं.. पुढे मंडणगडच्या दाट वसती मधून गाडीरस्ता आपल्याला थेट गडपायथ्याला घेवून जातो.. इथे गेटच्या बाजूला गाडी उभी करायची आणि थेट गडभ्रमंती सुरु करायची..  इथे गेट मधून प्रवेश करताच तुरळक तटबंदी आपले स्वागत करते.. आत येताच.. डावीकडे एक मंदिर आहे.. इथे मुख्य पायवाटेवर डावीकडे एक कमान कोरलेला दगड आहे.. आणखी पुढे जाताच.. पीराच्या दोन कबरी आहेत.. इथे डावीकडे एक तलाव आहे..  आणि वर जाताच .. डावीकडे.. भगव्या रंगात रंगवलेली एक तोफ आहे.. आणि थोडं पुढे.. किल्ल्याची पश्चिमेकडील बाजू.. किल्ल्यावर हेच महत्वाचे अवशेष.. इथे पोचलो तोवर सूर्य मावळतीला निरोप घेण्यास सज्ज झाला.. त्याला अलविदा करून.. रसाळ-सुमार-महीपत-पालगड-मंडणगड भटकंतीचा समारोप केला.. एका नव्या सह्याद्रीच्या भटकंतीसाठी..

धन्यवाद

माधव कुलकर्णी.. २०१६

संदर्भ सूची:-
RASALGAD FORT
Rasalgad Fort (Khed T.; 17° 45' N, 73° 30' E;), at the south end of the spur which further north is crowned by the Sumargad and Mahipatgad forts, has an area of about five acres. Less elevated than either of the above forts, Rasalgad is approached by an easy ascent which begins on the west and is about three miles from the village of Madave (Khed T.; p. 897). Narrow in the north, the fort gradually broadens, dividing in the south into two spurs, one running to the south-east, the other to the south-west. The fort is entered from the north by a very massive gate guarded by a tower and high battlements. In a crevice in the wall opposite the gate is an image of Maruti. About eighty yards inside is a second gateway, also strongly guarded by a tower and battlements. Further south, where the ground broadens, there is a temple with some rich wood carving. This temple, dedicated to the goddesses Zolaya and Vaghya, is of some local sanctity forming every year the gathering place for bands of worshippers from fourteen neighbouring villages. Both the spurs of the hill beyond the temple are fortified. On the south-east spur is a roofless building once used as a storehouse. Beyond the storehouse are some pools with near their banks several memorial stones with very dim weather-worn tracery. The spur after about 300 yards ends in. a battlement' known as the Pusati's Tower. The south-west spur is much more strongly fortified. The defences known as the upper fort, bale killa, about 186 feet by 126, are surrounded by walls, with, at each corner, an embrasured battlement. Inside are the ruins of a powder magazine and of the commandant's house. The temple of Zolaya and the image of Maruti show that the fort was built and for a time held by Hindus. The only trace of Musalmans is in the Upper Fort, a battlement known as the saint's tower, pir buruj. At present (1960), there are six guns on the fort.
The fort has an easy access but no inhabitants reside in it. However, people often use a big open ground inside the fort as a picnic spot. Puja of the Goddess Zolaya is performed daily and a fair is held in her honour in Navratra, Ashvin Sud., 1 to 10.
SUMARGAD FORT
Sumargad Fort (Khed T.), on the same spur of hill as Mahipatgad a good deal lower and about four miles to the south of it is about three-quarters of an acre in area. [Gov. List of Civil Forts, 1862.] Surrounded by walls from fifteen to twenty-two feet high, [Mr. A. T. Crawford's MS.] and with four corner battlements, the fort has a difficult access.
The fort, built of black stone, is still in a good condition. There are 16 guns in the fort. Inside the fort wall is a tank on an elevated land. There are no inhabitants in the fort. Two miles away from the fort on the western side there is a place, paga, where horses were kept. The way from the fort to the paga is built with stone steps. There are two temples on the fort, one of the god Bahiri and the other of god Shiv. From the top of the fort can be viewed the river Vaghnadi and the villages Mandve, Vadi, Jaitapur, Devghar and Ainavali and the fort Rasalgad.
MAHIPATGAD FORT
Mahipatgad Fort (Khed T.; 15° 50' N, 74° 20' E; p. 6477), about 19 miles from Khed, facing the Harlot pass and Makrandgad, the Mahabaleshvar ' Saddle back' stands at the head of a high spur, and running parallel to the Sahyadris is crowned by the three forts of Mahipatgad, Sumargad, and Rasalgad. Reached by a very narrow difficult pass six miles long, [The most direct practicable route from the northward is by the main road as far as the Government bungalow at Poladpur, whence to the left a path leads over broken ground, and after sighting the fort, winds among and over steep hills. Pursuing this pathway southwards, it is necessary to pass, at a distance of one and a half miles, along the whole west side of the fort. Reaching the valley, the ascent is gained over projecting spurs on the west and leading over the south continuation of the range the path winds over spurs on the eastern side of it, and reaches two hamlets, whence a steep pathway leads to the top. It is about four miles from the beginning of the ascent on the west to the interior of the fort. Report on Mahipatgad, 1854.] in 1880, Mahipatgad was a table-land 120 acres in area, with no surrounding wall, but with well-built battlements and gateways in six places where the approach was easy. The defences were in bad repair, the wood work had gone, and in many places the stone work was in ruins. On all sides the table-land was surrounded by the village of Beldarvadi [Beldarvadi, bricklayers' suburb, is a strip of rugged land said to have been assigned to certain bricklayers brought by Shivaji to build the fort.]. There were six gates, to the north, the Kotval gate formed by two battlements one on each side and joined with parts of the ramparts; to the north-east the Red gate, Lal Devdi; to the east the Pusati gate formerly entered by a ladder; to the south-east the Yeshvant gate and a thirty feet high battlement; to the south the Khed gate with traces of the path by which the garrison used to receive its supplies; and to the west the Shivganga gate called after a ling at the source of a rivulet. At the entrance of the south or Khed gate, was the foundation of a temple of Maruti and Ganapati, its walls half standing, half fallen. Here according to one account, there were 360, and according to another 700 stables [Foundations of this sort are found all over the fort.]. Further on was a stone house forty-five feet long by fifty-four broad, and a temple of Pareshvar, a very strong building about twenty feet long by thirty-eight broad. The six gates and the battlements have come down. There are cracks on the walls, due to heavy rainfall. It enjoys a yearly grant of Rs. 15. In the temple enclosure, are two ponds, with, on their banks, some engraved stones. The local story that the fort was begun and left half finished by Shivaji is supported by the heaps of mortar piled in several parts of the enclosure. The rough and uneven ground within the fort is over-grown with thorn bushes and other brushwood.
At present (1960), some Christians inhabit the fort area and there are to be seen a number of Christian tombs. From the fort one gets a good view of the red tiled steep roofed bungalows of Mahabaleshvar in the day time and twinkling lights on the slopes of Mahabaleshvar hills in the night. The village of Beldarvadi surrounding, the table-land is also clearly visible. Some of the villages on the border of Satara and Kolaba districts are easy to locate.

‘रसाळ–सुमार–महीपत’ ह्या किल्ल्यांची रांग सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर अशी दक्षिणोत्तर, पण स्वतंत्रपणे धावते. खरी मज्जा आहे, जर हे ३ किल्ले सुट्टे-सुट्टे न बघता, एका सलग डोंगरयात्रेमध्ये धुंडाळायचे, पुढे ‘जगबुडी’ नावाच्या भीतीदायक नावाच्या नदीच्या चिंचोळ्या खो-यात उतरायचं, अन् मधु-मकरंदगडाजवळच्या हातलोट घाटानं सह्याद्री माथा गाठायचा. ३-४ दिवसांचा ‘क्रॉसकंट्री’ ट्रेक मारायचा बेत आखला.


नावाप्रमाणे अत्यंत रसाळ अनुभूती देणारा रसाळगड
खेड गावापाशी मुंबई-गोवा हायवे सोडून गाडीरस्त्यानं २० कि.मी. अंतरावर रसाळगडाचा पायथा आहे. दूरवर सह्याद्रीची मुख्य रांग निळसर धुरकट दिसू लागली. गुगल मॅप्स आणि गावक-यांच्या मदतीनं योग्य ठिकाणी वळणं घेतली. पण, दाट झाडीतून जाणा-या वळणां-वळणांच्या चढ-उताराच्या रस्त्यावरून ‘रसाळ–सुमार–महीपत’ किल्ल्यांची रांग कुठेच दिसेना. शेवटी दिसला एक झाडीभरला डोंगर अन् माथ्यावर थोडकी तटबंदी. ‘अरे, हाच रसाळगड!!!’ ओळख पटली.


उभ्या चढावरून गाडीवाट चढून वाट अगदी रसाळगडाच्या जवळ पायथ्याशी घेऊन गेली. गाडीला अलविदा केला.


४ दिवसांच्या ट्रेकच्या सामानानं लादलेल्या बोजड सॅक्स पाठीवर चढवल्या. अगदी पायथ्यापासून गड चढण्याचे कष्ट नक्कीच वाचणार होते. गडाचा माथा उजवीकडे ठेवून १० मिनिटं आडवं जातानाही हृदयाचे ठोके वाढले, म्हणजे चला - झाला ट्रेकचा श्रीगणेशा!!! थोडक्या चढणीनंतर धारेवर पाण्याच्या सिंटेक्स टाकीपाशी पोहोचलो. धारेपासून हाकेच्या अंतरावर खाली रसाळवाडी अन् उजवीकडे वर गडाचं द्वार दिसलं.

दुस-या दिवसाच्या भटकंतीसाठी रसाळगड ते महीपतगड ही वाट लांबची अन् फसवी.. बरेचश्या ट्रेकर्सना सुमारगडच्या कातळारोहण वाटेमुळे म्हणा; किंवा खूप दमल्यामुळे असेल; किंवा वाटाड्यानंच घाबरवल्यामुळे सुमारगड सोडून द्यावा लागतो. त्यामुळे आम्ही वाटाड्या आवर्जून घ्यायचं ठरवलं होतं. रसाळवाडीत वाटाड्या मिळायला एक तास विनवण्या कराव्या लागतील, असं अज्जिबात वाटलं नव्हतं. झालंय असं, की गावात फक्त पोरं-बाया-वयस्क उरलेले. बाकी तरणी पोरं-पुरुष पोटा-पाण्यासाठी मोठ्या गावात-शहरात. वाटा मोडत चाललेल्या, अन् गावक-यांच्या गरजांसाठी जुन्या रानवाटा वापरायची गरज उरली नाहीये.... शेवटी, कसाबसा ‘दगडू’ नावाचा वाटाड्या ठरला, आणि आम्हांला हुश्श वाटलं.

आता, रसाळगडाच्या चढावर कूच केलं. गडाच्या पहिल्या द्वारापाशी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक बुरुज खुणावतो.


मारुतीबाप्पाचं दर्शन घेऊन उभ्या पाय-या चढून, उत्तम बांधणीच्या दुस-या द्वारापाशी पोहोचलो.


रसाळगडावरून लांबवर का होईना, पण सुमारगड अन् महिपतगड दर्शन तरी देतील, हा अंदाज साफ फसला. उद्याचा सुमारगडाकडचा प्रवास खडतर असणार, याची नांदी दिली उत्तरेकडच्या उत्तुंग धारेनं. असू दे, याचा नंतर विचार करू, असा विचार करून पुढे निघालो.

माथ्यावरच्या गवताळ पठारावरून ५ मिनिटात झोलाई देवीचं कौलारू राउळ गाठलं. कौलारू मंदिर, जवळची पाण्याची टाकी, दीपमाळ अन् पाठीमागची सुमारगडाकडे झेपावलेली डोंगररांग असं सुरेख दृश्य!


झोलाई देवीचं कौलारू राउळ मुक्कामास अतिशय उत्तम! 

गाभा-यात झोलाई देवीचं दर्शन घेतलं. वीज आहे. देवीची त्रैवार्षिक यात्रा असते.

मंदिरामागे किंचित उंचवट्यावर राजवाडा अन् बुरुजांची महिरप आहे.

देवळाजवळ पिण्याच्या पाण्याची २ तळी अन् पल्याड एक धान्याचं कोठार आहे. पावसा-पाण्यात गावकरी गुरं बांधत असल्यानं, राहण्याच्या दृष्टीनं यां वास्तूचा फारसा उपयोग नाही.

गडाच्या पाच एकर माथ्यावर भरपूर अवशेष आहेत. रसाळगड तेराव्या शतकात बहामनी राजवटीत बांधला अन् १६६० च्या कोकण मोहिमेत रसाळ-सुमार-महीपत हे दुर्गत्रिकुट शिवरायांनी स्वराज्यात आणलं. (संदर्भ: सांगती सह्याद्रीचा)
दक्षिण टोकापर्यंत हुंदडून आलो. गडापासून सुटावलेल्या टेपाडापलिकडे जगबुडी नदीच्या खोरं अन् मागे सह्याद्रीच्या मुख्य रांगेत पर्वत अन् महिमंडणगडाची टोकं खुणावत होती.

तर उत्तरेला पहिल्यांदाच झाडीभरल्या उभ्या डोंगररांगेमागे सुमारगडाचा कातळमाथा डोकावला. महिपतगड त्याच्याही मागे आडवा-तिडवा पसरला असावा. वैशिष्ट्यपूर्ण आकार काही जाणवला नाही.

रसाळगडाच्या दूरवरच्या दक्षिण टोकापासूनंच फक्त सुमारगडाचा माथा दिसतो, त्याच्या हा क्लोज-अप. उद्याच्या चढाईचे वेध लागू लागले होते...

परत मंदिराकडे येताना एका लवणात काही समाध्या दिसल्या. कोण-कुठल्या आयुष्यांच्या कथा इथल्या हवेत रुंजी घालत असतील, असं वाटून गेलं.

उघड्यावर झिजलेलं गजलक्ष्मी शिल्प विखुरलेलं, तर पल्याड शंकराची पिंड उघड्यावर तापत होती..

विखुरलेले अवशेष बघून  थोडं उदास वाटू लागलं, पण सभोवतालच्या रानव्यानं दिठी सुखावली.

गडावर शोधत गेल्यावर तब्बल १६ तोफा मोजल्या. काहींवर पोर्तुगीज/ इंग्रजी अक्षरे चिन्हे आहेत.

संध्याकाळचा गार वारा सुटला, अन् सूर्य पश्चिमेला कलला. रसाळगडानं थोडक्या वेळात आपलंसं करून टाकलं होतं. गडावर आज माजलीये फुटकळ झुडुपांची दाटी, अस्ताव्यस्त विखुरलेले दगड अन् भणाणणारं मोकाट वावटळ.. पण, गडावरची जोती, दरवाजे, समाध्या, तोफा, बुरुज, टाकी यांच्या पोटात दडलीयेत इतिहासाचे चढ-उतार, आनंद-उल्हास, जय-पराजयाची कित्येक हसू अन् आसवं.. आज मौनात गेलेल्या या भग्न अवशेषांचे पोवाडे गायचं कवित्व मात्र आपल्याकडे नाही, याची ‘हुरहूर’ वाटते... कधीतरी अलगद सूर्यास्त झाला.. 

पहाटेच्या थंडीत आलं-वाल्या स्पेशल चहाचे घुटके घेताना, पूर्वेला सह्याद्रीच्या धारेनं लक्ष वेधलं. तलम ढगांची पुसट रांगोळी कोवळ्या सूर्यकिरणांच्या चाहुलीनं लाजून रक्तवर्ण होवू लागली.

सह्याद्रीत भटकताना गड-किल्ल्यांवर मुक्काम नेहेमीच आनंद देणारा, पण ‘रसाळगडा’वर काहीतरी वेगळी जादू आहे. इथला मुक्काम नितांत सुंदर, उच्चकोटीचा, प्रसन्न अन् अवश्य अनुभवावा असा!!!


सुमारगडाकडे दमदार चढाई

रसाळवाडीतून रसाळगडाला ‘अलविदा’ करताना खूपंच जीवावर आलं. पण चाहूल लागली होती ट्रेकच्या पुढच्या आव्हानात्मक टप्प्यांची.

रसाळवाडीतून शेताडीतून उत्तरेला निघाल्यावर, धारेवरून वरचं पठार गाठण्याच्या ऐवजी, डावीकडून (बाण बघा) आडवं गेलो.

२०-२५ मिनिटं आडवं गेल्यावर उजवीकडे उभं चढून धारेवर पोहोचलो.

गवताळलेल्या धारेवरून मागं बघताना रसाळगड मागे दूर जाऊ लागला.

धारेवरची उभी वाट घामटं काढू पाहत होती.

वाटाड्या ‘दगडूभाऊ’ हा फारंच अवली माणूस निघाला. आम्ही २ मिनिटं विश्रांती घ्यायला लागलो किंवा चौकसपणे एखादा प्रश्न विचारायला गेलो, की संपलंच... पुढची १० मिनिटं दगडू-महाराजांचं भाषण सुरू.. अन् ते घसरणार मूल्यशिक्षण अन् जगात कशी वाईट लोकं आहेत, याच विषयावर.. फूल करमणूक!!! दगडू चलाख आहेच, पण गंमतीचा भाग सोडला तर या भागाची उत्तम माहिती असलेला वाटाड्या आहे.

वाट घसरड्या अरुंद आडव्या वाटेवरून जाऊ लागली. दरी खोलावत जात होती, तर रसाळगड झपाट्यानं मागे पडत होता.


शांतपणे दम टिकवून एक-एक पाऊल टाकत आम्ही अधिकाधिक उंची गाठत होतो.


गवताळ मुरमाड घसरडे डोंगरउतार चढत होतो, म्हणून बरे होते. हाच ट्रेक उलट्या दिशेनं केला असता, तर उतरायला जास्त त्रास झाला असता हे नक्की.


माथ्यापर्यंत न चढता अखेरीस वाट उजवीकडे पदरातल्या झाडीत लपलेल्या धनगरवाड्यापाशी आली. रसाळवाडीपासून इथं पोहोचायला १.५ तास लागले होते. अश्या दुर्गम जागी धनगर त्यांच्या गायी-म्हसरांबरोबर कसे टिकून राहत असतील, ही खरंच कमाल आहे... धनगरवाड्यापासून पहिल्यांदा जवळून दिसला ‘सुमारगडा’चा कातळमाथा.


धनगरवाड्यापासून झाडीतून आडवं जात सुमारगडाच्या जवळ जावू लागलो. सुमारगडाची वाट दुर्गम, गचपणीची अन् सहज सापडत नाही. त्यातंच शेवटच्या टप्प्यांत दृष्टीभय असलेलं कातळारोहण करावं लागतं, म्हणून बरेचसे ट्रेकर्स सुमारगड चढायचा प्रयत्न करत नाहीत. अर्थात, सुमारगड चढण्याचा प्रयत्न न करणं किंवा चढायला न जमणं, यात फार वाईट वाटून घ्यायचं कारण नाही.


सुमारगडाची थ-रा-र-क चढाई
मोकळवनात सुमारगडासमोर आल्यावर इथून गडावर जायला दोन वाटा आहेत.
पहिली वाट म्हणजे, थेट गडाच्या कातळमाथ्याच्या दिशेने घसा-यावरून चढत, कातळमाथा डावीकडे ठेवून आडवं जाणे व गडाचा कातळारोहण मार्ग गाठणे. (सूचना: ही वाट अजिबात घेऊ नये)


दुसरी वाट थोडी लांबची आहे. पण गडाचा माथा गाठण्याच्या यशाची शक्यता अन् सुरक्षितता नक्कीच वाढते. म्हणूनंच आम्ही घेतली दुसरी वाट. मोकळवनातून डावीकडील दाट झाडीत शिरणारी वाट घेतली. सुमारगडाचा माथा उजवीकडे उंच वर ठेवत हळूहळू वर चढू लागली.


आडवं वर चढत चढत सहज मागं वळून पाहिलं, तर सुमारगड पूर्ण मागे पडला होता.

शेवटी आम्ही पोहोचलो दाट झाडीभरल्या खिंडीत, म्हणजे मोकळवनातून दिसलेल्या सुमारगडाच्या बरोब्बर मागच्या बाजूस आम्ही पोहोचलो होतो. ही खिंड आमच्या भटकंतीतला एक महत्त्वाचा माईलस्टोन होता. कारण, आता खिंडीतून सरळ उतरणारी वाट महीपतगडाकडे जाणार होती, तर उजवीकडे दक्षिणेला जाणारी वाट सुमारगडाकडे जाणार होती. सकाळी लागलेल्या धनगरवाड्यापासून सुमारगडाची ही खिंड गाठायला आम्हांला १ तास लागला होता.

सुमारगडावर जायचंच आहे, असं म्हणल्यावर दगडूभाऊंनी थोडा भाव खाल्ला, “पोरंहो, वाईच अडचन हाय रानात.. बगा, जमणारे कां तुम्हांस्नि..”. अर्थात, दगडूभाऊंकडे दुर्लक्ष करून चिक्की, गुळपोळी अन् ग्लुकोन-डी चा मारा करून ५ मिनिटांत सुमारगडाकडे कूच केलं. कारवीच्या दाट रानात सॅक दडवून ठेवल्या. अन्, उभा छातीवरचा ५ मिनिटं चढ चढल्यावर पाठीमागे प्रथमंच महीपतगडानं दर्शन दिलं.


आडवी वाट झाडीतून सुमारगडाकडे निघाली.


मधल्या मोकळ्या धारेवरून समोर खोल दरी अन् उजवीकडे सुमारगडाचा कातळमाथा असं पॅनोरमा दृश्य समोर होतं.


सुमारगडाच्या अगदी पायथ्याच्या धारेवरून चढून कातळमाथ्याच्या पायथ्याशी पोहोचलो. फारशी मळलेली नसली, तरी एकंच एक वाट आहे. सुमारगडाच्या उत्सुकतेमुळे अन् वा-याच्या झोतांमुळे दम लागला, तरी आम्ही ताडताड पुढे जात होतो.


कातळमाथ्याला डावीकडून वळसा घालत घुसलो. डावीकडच्या दरडावणा-या दरीकडे काणाडोळा करून पुढे गेलो.


वाट खूपंच बारीक अन् गचपणाची-अडचणीची होती. थेट दृष्टीभय नसलं, तरी ती जाणवत होतीच ना... अश्या ठिकाणी, पुरेशी विश्रांती घेणं अन् मग शांतपणे एक-एक पाऊल टाकणं महत्त्वाचं.

अखेरीस पोहोचलो सुमारगडाच्या सुप्रसिद्ध कातळारोहण टप्प्यापाशी.

अंदाजे ६० फुटांचा हा कातळारोहण टप्पा. कसलेल्या ट्रेकर्सना अवघड अजिबात नाही.

कातळ अवघड कुठेच नाहीत. आम्ही दोर वापरला नाही अन् दोर वापरायची गरज सुद्धा वाटली नाही. (माथ्याजवळच्या एका झाडाला दोर बांधता येऊ शकेल.)

पण ट्रेकर्सना सुमारगड आव्हानात्मक वाटत असावं, याची कारणं म्हणजे एकतर आपण खूपंच अडचणीच्या वाटेनं इथे पोहोचतो. दुसरं म्हणजे दमलेल्या अवस्थेत दृष्टीभय असलेल्या द-या बाजूला असताना हा कातळ चढणं मानसिकदृष्ट्या अवघड होत असावं.

अखेर आम्ही पोहोचलो सुमारगडाच्या माथ्यावर!
रसाळ-महीपत मार्गावरच्या खिंडीपासून निघाल्यापासून पाऊण तास लागला होता, तर रसाळगडापासून सुमारगडाच्या माथ्यावर पोहोचायला साडेचार तास लागले होते. माथ्यावर रानटी झुडुपं माजलेली. एका देवतेची मूर्ती दिसली.

पाण्याची एकाजवळ एक खोदलेली थोरली ४-५ टाकी.

डावीकडे कातळकोरीव गुहा दिसली.

गुहेत अर्थातंच होती शंकराची पिंड. ‘शंभो शंकरा’च्या स्वरांनी दुर्गम दुर्गावरील शिवशक्तीस आळवलं. शंकराच्या पिंडीवरील अभिषेक व्हावा, म्हणून तांब्यात पाणी घालायला गेलो तर त्यातून बाहेर पडला एक विंचू!!!

भीती नाही, पण (सॉरी) किळस वाटून गुहेबाहेर आलो, तर इकडे दगडूभाउंनी ‘पोरंहो, परत लवकर चला ना’, असं तुणतुणं वाजवायला सुरुवात केली होती. एव्हाना त्याच्याकडे दुर्लक्ष करायला आम्ही सरावलो होतो. गचपणातून पुढं वाट काढत गेल्यावर एक खांब सोडून कातळाच्या आत कोरत नेलेलं टाकं दिसलं.

दक्षिणेला बघितल्यावर समोरचं दृश्य वेडावणारं होतं, कारण याच बंबाळ्या रानातून अन् डोंगररांगांमधून आपण रसाळगडापासून चालत आलोय, यावर विश्वासंच बसेना.

तर उत्तरेला होतं अस्ताव्यस्त पसरलेल्या महीपतगडाचं दृश्य!

पूर्वेकडे जगबुडी नदीच्या खो-यापलीकडे सह्याद्रीची निळसर रंगाची भिंत अन् त्यावरचा मानाचा तुरा – मधु-मकरंदगडाची जोड-शिखरं!

बाकी ३ एकर क्षेत्रफळात पसरलेल्या गडावर तुरळक जोती अन् तटबंदी दिसते. अर्ध्या तासांत गडफेरी अन् विश्रांती घेऊन वेळ आली सुमारगडाला अलविदा म्हणायची. परतीच्या मार्गावर परत एकदा ६० फुटी कातळाचं कोडं सोडवणं आलं. सुमारगडाचा कातळ उतरायची सुरुवात होते इथून... थरारक!!!

सावकाश कातळटप्पा उतरल्यावर हुश्श केलं. उजवीकडे २० पावलांवर कातळकोरीव थंड पाण्याचं टाकं आहे. सुमारगडाची दक्षिणेकडून चढणारी घसा-याची वाट याच टाक्यापाशी पोहोचते. पाण्याचा मारा करून, तापलेली इंजिनं गार केली.

आल्यावाटेनं परत उत्तरेला महीपतगडाच्या दिशेनं निघालो. परत एकदा अशक्य गचपण, अरुंद वाट अन् दृष्टीभय!!!


थोडं मोकळ्यात आल्यावर बरं वाटलं. पाठीमागे सुमारगडाचा कातळमाथा अन् टोकावरचा बुरुज उन्हांत तळपत होते.

रसाळ-महीपत मार्गावरच्या खिंडीपासून निघून सुमारगड बघून परत यायला २ तास लागले. तासाभराची थंडगार सावलीत विश्रांती, रुचकर जेवण अन् ताक पिऊन तुकडी ताजीतवानी झाली. 

घनदाट जंगलात मळलेल्या वाटेवरून आमचं आजचं गंतव्य ‘महीपतगड’ समोर दिसू लागलं.

दगडूभाऊंच्या कृपेनं जवळच्या वाटेनं महीपतगडाच्या पायथ्याजवळ आलो. सकाळी निघाल्यापासून ७ तास झाले होते. माहितगार व्यक्ती सोबत नसताना रसाळ-सुमार-महीपत अशी वाट शोधणं अशक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. डोंगररचना क्लिष्ट आहे अन् पल्ला खूप लांबचा आहे. वाट समजा चुकली तर दुप्पट वेळ जाणार... दगडूभाऊंना उजेडात परत रसाळवाडीला पोहोचता यावं, म्हणून त्यांच्या आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम पार पाडला. मानधन, फळं अन् पाणी सोबत देवून निरोप घेतला.


दांडावरचा उतार उतरून ओढ्यापाशी पोहोचलो. महीपतगडावर येणारे बरेचसे ट्रेकर्स पायथ्याच्या दहिवली गावातून ४-५ तास चढाई करून इथे पोहोचतात. समोर बेलदारवाडीची घरटी दिसू लागली. वाडीत अगत्यानं स्वागत अन् कोरा चहा पुढे आला. तिस-या दिवशीच्या वाटचालीसाठी परत एकदा वाटाड्या ठरवला. महिपतगडाच्या वाटेवरून, उतरंडीला  लागलेल्या उन्हांतला सुमारगड, त्यांच्या डोंगरवळया अन् पायथ्याची बेलदारवाडी हे दृश्य देखणं होतं.


अजून झूम करून बघितल्यावर, आव्हानात्मक अश्या सुमारगडाच्या चरणी नतमस्तक झाल्याचं मनोमन समाधान वाटून गेलं.


उभ्या दांडावरची मळलेली वाट विजेच्या तारांसोबत महीपतगडाचा चढ चढू लागली. थोडके बुरुज खुणावत होते. अर्थात, संरक्षणासाठी गडाचं दुर्गमत्व हेच खरं अस्त्र!


१२० एकर क्षेत्रफळाच्या विस्तृत गडाच्या भेटीसाठी स्वतंत्र दिवस अन् वाटाड्या हवा. गडावर ६ दरवाजे – उत्तरेला कोतवाल दरवाजा, ईशान्येला लाल देवडी, पूर्वेला पुसाटी दरवाजा, आग्नेय यशवंत दरवाजा, दक्षिणेला खेड दरवाजा, पश्चिमेला शिवगंगा दरवाजा. (संदर्भ: महाराष्ट्र शासन गॅझेटिअर) माथ्यावरचं तुडुंब दाट रान बघून, ठाणे जिल्ह्यातल्या माहुली गडाची आठवण आली. पुढच्या वाटेची खूण म्हणजे विजेच्या तारांसोबत उजवीकडे जायचं. अन्यथा, इथे रानात हरवणं, ही सगळ्यात सोप्पी गोष्ट आहे. जुन्या बंधा-यापाशी आलो. जवळ मारुती अन् गणपतीचं ठाणं आहे म्हणे. (जे आम्ही बघायचं विसरलो.)


१५ मिनिटात वाट ‘पारेश्वर’ महादेवाच्या राउळापाशी पोहोचली. आख्ख्या दिवसात रसाळगडावरून सुमारगड करून महीपतगडावर पोहोचायला ९.५ तास लागले होते, पुरेशी विश्रांती घेत, धावधाव न करता पण उगाच वेळ वाया न घालवता....
घनदाट रानातलं गडावरचं रोज पूजा होणारं शिवमंदिर – पत्र्याची शेड अन् फरश्या घातलेल्या - आसपासची मोकळी जागा - विजेची सोय – समोर पाण्याची विहीर अशी ही मुक्कामास झ्याक जागा!!!


पोहोचलो असू-नसू तोच, हळूहळू अंधार दाटू लागला. थंडी दणदण वाढू लागली. विहिरीवरून पाणी भरून आणलं. सूप-खिचडी रटरटू लागली. मिट्ट काळोखात आसपासचं रान अजूनंच गूढ वाटू लागलं. शेकोटीच्या उबेवर हात शेकताना, पलीकडच्या झाडांवर आमच्या थरथरणा-या सावल्या उमटू लागल्या.. दिवसभरात भटकलेल्या वाटा, डोंगरद-या, घसारा-कातळ, रानफुलं-पाखरांच्या शीळा मनी रुंजी घालत होत्या...

जगबुडी खो-याची अनवट वाट
दिवस तिसरा उजाडला. आजचा पल्ला अजून मोठा होता. महीपतगड बघून जगबुडी नदीच्या खो-यात उतरायचं. पुढे  हातलोट घाटाच्या पायथ्याशी बिरमणी गाव गाठायचं. अन् जमलंच तर हातलोट घाट चढून सह्याद्री घाटमाथ्यावर पोहोचायचं असा ताकदीचा बेत होता. सकाळी बघतो तर काय, आमची टीम डाऊन!!! रात्री टीममधल्या ब-याच लोकांना आम्ही कधीच ट्रेकला अनुभवला नव्हता, असा उलट्यांचा त्रास झाला. दिवसाभराच्या उन्हां-तान्हात दगदगीचा, रानोमाळचं पाणी पिण्याचा अन् अपचनाचा परिणाम असावा, असं वाटलं. अश्या परिस्थितीत ट्रेकचा खूप ताण झेपणार नव्हता. आपण ट्रेकचा जोपर्यंत आनंद लुटू शकतोय, तोपर्यंत ताण अन् कष्ट घेण्यात अर्थ असतो. शेवटी महिपतगड दर्शन न करता निघण्याचा निर्णय घेतला.

पोरं मात्र मोठ्ठ्या जिद्दीची. ठरल्या वेळेला निघायला तय्यार. शरीरं शिणली होती, पण इरादे पक्के होते. पारेश्वर महादेवाला वंदन करून यशवंती दरवाज्याच्या अनवट वाटेनं महिपतगड उतरून, जगबुडी नदीच्या खो-यात वडगावला पोहोचणे, हे पहिलं ध्येय होतं. गडाच्या दाट झाडीपासून आग्नेयेच्या यशवंती दरवाज्याच्या दिशेनं निघालो.


यशवंती बुरुजापाशी चुन्याचे ५-६ बुरुज/ संरक्षक आडोसे वैशिष्ट्यपूर्ण होते.

पल्याडच्या दरीचं खोलवर दर्शन थरारक होतंच, पण खरंतर टीमचा फिटनेस बघता ते टेन्शनंच वाढवणारं होतं.


यशवंती बुरुजाखालचा घसारा अन् त्याखालचा उभा उतार उतरलो.


कातळाचे टेपाड असलेल्या माथ्याला डावीकडे ठेवून आडवं जात राहिलो. महिपतगड मागे मागे पडू लागला.


अचानक लक्षात आलं, आपण सुमारगड अन् महिपतगड यांना समांतर धावणा-या रांगेवर आहोत आपण, समोर लांब दिसते ती सुमारगडाची रांग अन् उजवीकडे महिपतगड!!! एक झ्याक पॅनोरमा घेऊन टाकला


यशवंती बुरुजापासून उतरणा-या रांगेपासून डावीकडे दरीत उतरणा-या सोंडांपैकी तिस-यां सोंडेवरून वाट उतरणार होती. त्याच्या अलीकडच्या घळीत पोहोचण्यासाठी आम्ही आडवं-आडवं जात राहिलो.


नैऋत्येला समोर सुमारगडाचा उभार अन् त्याचा कोसळलेला कडा थरारक होता.


आमची टीम थकव्यानं सारखी सारखी विश्रांती घेत असूनही त्रागा न करता, आमच्या सोबत येणारा वाटाड्या – राया. मोजकंच पण मोलाचं बोलणा-या बुद्धिमान रायानं आम्हांला कधीच मनोमन जिंकलं होतं. वाटाड्या ‘राया’ यांना जड अंत:करणानं निरोप दिला. थोडक्या वेळात जुळलेले आमचे मैत्र – कारण एकंच ‘सह्याद्रीप्रेम’.


महीपतगडाच्या पारेश्वराच्या राउळापासून निघाल्यावर, अडीच तासांच्या चालीनंतर खो-यात उतरणा-या सोंडेच्या घळीपाशी आलो. घळीच्या दाट झाडीतून घसरड्या वाटेवरून १०० मी उतार उतरलो.


सह्याद्रीच्या दुर्गम भागाचं वैभवाचं कवतिक डोळ्यांत साठवत होती.


थोडका अशक्तपणा जाणवत असल्यानं, उभ्या सोंडेवरून दाट रानातून ४०० मी. उतरणं, खूपंच जड गेलं. पण, कोणीही हार मानली नाही.


रानात झाडाखाली काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण दिसलं. काटक्या अन् पानं रचून ‘हे’ काय अन् कश्यासाठी बनवलं होतं, कुणास ठावूक!


नदीच्या काठावरून शेताडीतून वडगाव खुर्दकडे निघालो, तर उभ्या डोंगररांगांनी पिंगा घातला होता.


कोण्या एक्या खोडाची पानं वठलेली, पण आख्खं खोड मश्रूम्सनी लगडलेलं..


वडगाव खुर्द हे कोकणातलं टिपिकल देखणं निवांत गाव, सह्याद्रीच्या अगदी कुशीत वसलंय.


दमलेल्या ट्रेकर्सच्या मदतीला सह्याद्रीनंच बहुदा पाठवली असावी, एसटीची लाल बस. वडगाव खुर्द ते बिरमणी प्रवासातले ४ कि.मी. चाल वाचली होती.



एसटी सोडल्यावर बिरमणी गाव अजून ४ कि.मी. दूर होतं. डांबरी सडकेवरून चालणं, नेहेमीप्रमाणे जीवावर आलं. पण, समोर उठावलेले सह्याद्रीचे जब-यां पहाड उत्साह संचारला.


सह्याद्रीमाथ्याची उंची जिथे सर्वात कमी, अश्या डावीकडच्या खिंडीतून हातलोट घाटाची वाट असणार होती.


मधु-मकरंदगडाचे पश्चिम कडे उन्हांत तळपत होते.


अखेर आलं हातलोट नावाचं छानंसं गाव. ट्रेकच्या तिस-या दिवशी टीम आजारी असताना मर्यादित ५-६ तासांची चाल करून, दिवसासाठी ठरलेलं लक्ष्य साध्य केलं होतं अन् हातलोट गावात मारुती मंदिरात मुक्काम करायचं ठरलं.


गावातल्या जबाबदार माणसांनी आपुलकीनं चौकशी केली. त्यातल्या प्रेमळ आज्जींना विसरणं अवघड आहे.


लवकर जेवणं करून लख्ख चांदण्यात शतपावली मारून झाली. अन् लवकरच मारुती मंदिरात घोरण्याचे आवाज विविध सूर-ताल-लयीत घुमू लागले.

नितांतसुंदर हातलोट घाट
आणि उजाडला ट्रेकचा चौथा दिवस. पहाटे उजाडायच्या आत कूच केलं. सह्याद्रीत दिवसोंदिवस ट्रेक करण्याची मज्जा आम्ही चाखत होतो. गावाबाहेरच्या सह्याद्रीच्या उंच भिंती आमच्या तीनही बाजूंनी उठवल्या होत्या. पायथ्याचं टुमदार राउळ होतं – भैरी कुंबलजाई देवीचं.


मधु-मकरंदगडाचे पश्चिम कडे अशक्य उंच दिसत होते.


१० मिनिटात नदीचं पात्र पार करून, हातलोट घाटाची वळणं सुरू झाली. घाटाची सुरुवात दाखवायला इथंपर्यंत बिरमणी गावातले गुरव हातलोट सोबत आले. त्यांना निरोप दिला.


पूर्वेला उगवतीच्या नानाविध छटा मधु-मकरंदगडाच्या धारेवर उमटत होते.


मंद चढणीचा, वळणां-वळणांचा असल्यानं हातलोट घाट अर्थातच लांबचा मार्ग. पण आहे मात्र नितांत सुंदर!!! एखाद्या खट्याळ पाखराची मोहक शीळ सतत घुमत होती, अन् सोबतीला रानफुलांचे ताटवे. 


मधु-मकरंदगडाच्या धारेवरून आता सूर्यकिरणं मंदपणे उतरू लागली.


चार दिवसांच्या दमदार चालीमुळे ट्रेकर्स जब-या ‘ह्रीदम’ मध्ये आलेले. त्यामुळे चढाईचा थकवा कोणालाच नाही.


आता घळीतून चढणा-या वाटेसोबत उंच कातळभिंती सोबतीस आल्या, म्हणजेच सह्याद्री माथा जवळ आलेला.


जगबुडीचं खोरं आपल्याच मस्तीत धुकटात हरवलं होतं.


हातलोट घाटाच्या माथ्यावर पोहोचतोय, तर ‘फडफड फडफड’ अश्या जोरात आवाजानं दचकलो. विशाल आकाराच्या धनेश पक्ष्यानं (Great Indian Hornbill) स्वागत केलं होतं.

(प्र.चि. साभार - विकिपीडिया)

सह्याद्री माथ्यावर पाण्याच्या कोरीव टाक्यानं अन् सदाहरित अरण्याच्या दर्शनानं सुखावलो. टाक्याचं पाणी मात्र वन्यजीव वापरत असावेत, त्यामुळे पिण्यायोग्य नाही.

सह्याद्री माथ्यावर आल्यावर देखील मधु-मकरंदगड अजून जास्त आभाळात घुसल्यासारखा वाटू लागला.


सदाहरित रान - खळाळणारे झरे – कुठे शेताडीत लावलेलं पीक – हवेत सुखद गारवा..  – सह्याद्रीच्या कुशीतल्या हातलोट गावच्या आम्ही प्रेमात पडलो.


ठरवलेली गाडी आम्हांला परत न्यायला अगदी वेळेवर इतक्या दुर्गम जागी पोहोचली होती.

 तीन तासाची पायपीट केल्यानंतर आम्ही वाडी बेलदार ह्या वाडीत येऊन पोहोचलो. कोणीतरी आपल्या वाडीत येतय हे लांबूनच दिसल्यावर वाडीतील  वयस्कर वडीलधारी मंडळी स्वागताला उभीच होती. सर्व प्रथम आपुलकीने चौकशी सुरू झाली. कोठून आलात पोरांनो कोठे जाणार वगैरे. तसं ह्या गडाकडे जास्त कोण फिरकत नाही. त्यामुळे आमचे त्यांना खुप कौतुक वाटत होते. येथेच पाणी वगैरे पिऊन थोडी विश्रांती केली. येथून गडावर पोहोचायला आजून तासभर लागेल असं येथील लोकांनी सांगितलं.
     साधारण वीस बावीस घरांची वस्ती आसलेली ही वाडी. कामा व शिक्षणासाठी लोक मुंबई पुण्याकडे असल्यामुळे वाडीतील निम्मी घर बंद आसतात. वाडीत वास्तवाला असणारी मंडळी ही बरचशी वयस्करच आहे. पण सारेच खुप प्रेमळ. सह्याद्रीच्या खो-यात राहूनच हा निर्मळ पणा ताजा राहू शकतो. वाडीतील त्या लोकांचा निरोप घेऊन, वाढीच्या मागील बाजूस कडून आसणरी पायवाट आम्हाला थेट गडाकडे घेऊन जात होती.
वाडी बेलदार 

☆ थरारक

     उभी चढाई असल्यामुळे ही वाट कस काढणारी होती. वाट थोडी निसरडी होती त्यामुळे प्रत्येक पाउल संभाळूनच टाकावा लागत होते. एका बाजूस अथांग खोल दरी तर एका बाजूस सह्याद्रीचे उभे कडे. येथूनच ख-या ट्रेकचा थरार सुरू झाला. पण सोबतीला योग्य साथीदार आसले की वाटा किती ही थरारक आसूदे प्रवास सोप्पाच वाटतो. तसाच आमचा ग्रुप होता. एकमेकांची योग्य काळजी घेत आम्ही चढाई करत होतो. वा-या सोबत येणारी पावसाची सर खुप बोचरे अनुभव आता देत होती. साधारण ४० मिनिटांची उभी चढाई केल्या नंतर आम्ही खेड बुरुजापाशील खेड दरवाज्या समोर पोहचलो. आजून ही बुरुजाची तटबंदी खुप भक्कम अवस्थेत आहे. आता वरील सारा भाग एका पठारा प्रमाणे होता. पण ह्या पठारावर खुप घनदाट जंगल आहे. खेड बुरुजा पासून काही अंतरावरच एक गोड्या पाण्याची विहीर आहे. ह्या विहीरीच्या समोरच्या झाडीत शिरणारी वाट आम्हाला गडावरील नागेश्वराच्या मंदिरात घेऊन जाणार होती. धुके दाटल्यामुळे सारेच घनदाट वाटत होते. ह्या घनदाट झाडीतून वाट काढत आम्ही नागेश्वराच्या मंदिरात पोहोचलो.




















खेड बुरुज 

खेड बुरुज 


खेड बुरुजा पासून पारेश्वराच्या मंदिरकडे घेऊन जाणारी पायवाट 





   साधारण साडे तीन तासांची पायपीट केल्यानंतर आम्ही गडावर पोहचलो होतो. मंदिर पुर्ण धुक्यात हरवले होते. आज श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिराचे पुजारी अनंत बुवा जाधव हे मंदिरातच होते. ह्या पुजा-यांजवळ माझी गेल्या वर्षीच्या ट्रेक दरम्यान ओळख झाली होती. आपल्या जर पुर्ण गड व्यवस्थित पाहायचा आसेल तर अनंत जाधव हे आपल्या योग्य प्रकारे गड दर्शन घडवू शकतात. त्यासाठी मी त्यांचा मोबाईल नंबर येथे ठेवत आहे ७७०९९६४४०६.
      सर्वानी सर्व प्रथम पारेश्वराचे दर्शन घेतले. तो पर्यंत जाधव बुवांनी मंदिरातील चुलीवर आमच्या साठी चहा ठेवला होता. आता पोटातील कावळे ओरडत होते. हातातील घड्याळ पाहिलं तर साडे तीन वाजून गेले होते. सोबत आणलेला चटणी भाकरीचा डबा उघडून मी सर्व प्रथम पोट पूजा करायला सुरुवात केली. तसे बाकीचे साथीदार ही येऊन बाजूला बसले. तेवढ्यात जाधव बुवांनी गरमागरम को-या चहाचा भरवेला कप आणून समोर ठेवला. चहा बद्दल काय बोलू, खुपच झणझणीत चहा. गारठलेल्या शरीरासाठी ते अमृतच आसतं.... अजून काय हवं होत. एक चटणी भाकरचा तुकडा तर एक घोट चहाचा.... असली श्रीमंती राजाच्या महालात ही नाही.
     मंदिरात थोडा आराम करून जाताजाता जेवढं शक्य होईल तेवढं गड पहात परतीच्या प्रवासाला लागायचं असं ठरलं. काळोख पडायचा आता गडाचा पायथा गाढायचा होता. आधीच खुप उशीर झाला होता.
पारेश्वर मंदिरा समोरची विहीर 

पारेश्वर मंदिर समोर मी
पारेश्वर मंदिर 











धुक्यात हरवलेले मंदिर 




☆ किल्ले महिपत गड

      खेड तालुक्याच्या पुर्वेस आसणा-या ह्या किल्ल्याची समुद्र चौकटीत पासून उंची ३०९० फूट येवढी आहे. १२० एकर क्षेत्रफळ असलेल्या ह्या किल्ल्याला एकून सहा दरवाजे आहेत. ईशान्य दिशेस लालदेवडी दरवाजा, पुर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेस खेड दरवाजा ह्याच मार्गाने आम्ही किल्ल्यावर प्रेवश केला, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा या दरवाज्या जवळ शंकराची पिंड आहे, उत्तरेस कोतवाल दरवाजा येथे मारूतीचे मंदिर आहे, तर आग्नेयेस यशवंत दरवाजा आहे. मात्र आता हे सारे दरवाजे नाममात्र उरले आहेत. शिवाय गडावर पारेश्वराचे मंदिर आहे. ह्या मंदिरात वाडी बेलदार मधील लोक महाशिवरात्री खुप उत्साहाने साजरी करतात. एक वेळ मी ह्या सोहळ्याचा साक्षीदार होतो. पारेश्वराच्या मंदिरा समोर एक गोड्या पाण्याची बाराही महीने तुडूंब भरलेली विहीर आहे. ह्या मंदिरात एक वेळस २० ते २५ जन आरामात निवास करू शकतात. मंदिराच्या आजूबाजूला अनेक पाषाणी अवशेष सापडतात. किल्ल्याचा संपुर्ण भाग म्हणजे घनदाट जंगलाच एक पठारच आहे. ज्या ठिकाणी कडे चढण्यास सोप्पे आहे तेथेच तटबंदी उभारण्यात आली आहे. ह्या किल्ल्यावर उत्खनन केल्यास अनेक ऐतिहासिक खुना सापडू शकतात.
एक उनाड क्षण

धुक्यात हरवलेले पारेश्वर मंदिर 



इतिहासाच्या खुना









☆ परतीचा प्रवास

     चार वाजून केव्हा केले ते कळालंच नाही. परतीच्या वाटेवरील प्रत्येक आठवणींचा दगड काळजात साठवत व हा अथांग सह्याद्री डोळ्यात जपत, खेड दरवाज्यापासून सुरू होणारी ती निसरडी पायवाट खुप सावधपणे पुढील ३० मिनिटांत उतरून आम्ही वाडी बेलदार मध्ये पोहचलो. येथील लोकांचे प्रेम घेऊन आम्ही पुढील प्रवास सुरू केला. ह्या सह्याद्रीत फिरताना तुम्ही कितीही थकलात तरी तुमच्या चेह-यावरचे चैतन्य हा सह्याद्री केव्हाच कमी होऊ देत नाही. ठरल्याप्रमाणे आम्ही अंधार पडायच्या आताच म्हणजे साडे सहा वाजताच गाडी जवळ पोहचलो. सर्वांनी एक आवाजात हर हर महादेव अशी गर्जना देत गाडीत आपआपली जागा पकडली. व बोरघरच्या दिशेने उलट प्रवास सुरू झाला. आता मात्र एकमेकांच्या चेह-याकडे पाहातच शांततेत प्रवास चालू होता. प्रत्येकांनी हा अथांग सह्याद्री ह्रदयात साठवला होता. पण मन मात्र अजूनही त्या द-या खो-यांमध्येच बागडत होतं. आम्हाला घरी पोहोचे पर्यंत रात्रीचे आठ वाजले होते.
     सारा अनुभव खुप सारी ऊर्जा देणारा होता....
धन्यवाद.....               

                                                                                                     किरण प्रकाश बोरकर

Mahipat-Sumar-Rasal Forts - Adventurous Trio

After exploring sea forts in last two tours it was time to explore hill forts in Konkan. Some of the members in our group, were talking about this trek since last two years but we were not getting any opportunity to execute it. As this range requires a good three days to explore, we weren't able to find convenient three dates back to back as most of our group members work with reputed companies and getting holiday is a task. Finally, we zeroed down on dates of 23-24-25 Jan 2016, as 23-24 Jan were Saturday and Sunday, 26th Jan is a public holiday, everybody decided to take a casual leave on Monday 25th Jan, so they can rest the next day after trek and resume office from 27th Jan. After some friction in the number of members joining this trek, 8 people were finalised and for travel purpose Two Wagon R's were finalised. We collected some primary information from the blogs written by trekkers who had previously visited this trio, spoke to them on phone, gathered all details from books like "Sangati Sahyadri" and Gazeteer website. We came to know that Sumargad has a 50 feet rock patch, which is a bit tricky at certain stages and there is a need of safety rope for same, although villagers have fixed a wire on the patch. Just not to take any chances, we arranged a rope from one of our member's friend. Finally the plan was ready and all were eager to execute it.

Some of the group members had questions about doing this trek by vehicle, as lot of trekkers do this exhausting trek by walking around 30-35 kms. The original route for trekkers start from Dahivali, this village is parallel to Kashedi Ghat towards Mahabaleshwar, it can be reached from Khed by ST or by hiring private vehicle. Then the route goes from Dahivali - WadiBeldar(3 hours) - Mahipatgad(1 and 1/2 hour) - Sumargad (1 and half hour) - Rasalgad (6 hours), all this route by walking. The whole route tests the stamina and willpower of trekker. But as we studied and gathered details, we came to know that State Tourism dept has been working hard to convert these forts into famous tourist spots like Raigad and Pratapgad. A road till Rasalgad base has been completed and your vehicle can reach the base, from where it is only 30 mins climb to top. Likewise, road is being constructed till Wadi-Jaitpur, from which you can reach Wadi Beldar 3 hours by walking, which is base village for both Mahipatgad and Sumargad. Hoping for the best we started from Panvel on Saturday 23rd Jan morning and reached Khed around 3 PM. Just before you reach Bharana Naka, Khed on Mum-Goa Highway, you can see sign boards indicating Left Arrow to Mahipatgad and Rasalgad. Taking left from Bharana Naka, in just 17 kms you reach base of Rasalgad. The final 2-3 kms of the route is still being constructed and passes through a long traverse, left hand side of which is a deep valley, please beware while driving. We reached Rasalgad as sun was going down. It was being said by previous visitors that sunset at Rasalgad is one of the best you will be seeing in your life. Rasalgad gives an awesome 360 degree view of ranges in Konkan and Mahabaleshwar.

Rasalgad, from the place where we parked our vehicles

First door of Rasalgad

Hurriedly we gathered our bags, left vehicles at the base and reached top in 30 mins, to see the sunset and click pictures. Enroute we came to know from a villager that there was a function at the Zolai Devi Mandir on the fort, called 'Gondhal'. All of the group members were happy that they will be getting a good hearty meal without paying anything because of function in the temple. There are two most prime qualities of trekkers, first they are no.1 bhukkads and second they are no. 1 jugaadus. After reaching top, we left our bags in the temple which was our abode for first night, temple is spacious and 20-25 people can easily accomodate inside it. We decided to explore the whole fort in morning and without wasting time we reached the western point of the fort from which the sunset was looking beautiful. For around half hour camera clicks were not stopping and we did lot of photography before sun finally went down.
 

Zolai Devi Mandir on Rasalgad
Deepmal in front of the Zolai Devi Temple

One of the best moments of this trek
At night, we participated in the function and ofcourse had a good lunch after that. One more group of middle aged men were partying in the same premises, they shared a local cuisine called 'Popti' with us, which is cooked in a pot having layers of chicken, eggs, beans and locally available leaves called 'bhamburda'. Before going to sleep, we went for a walk on fort, as it was a day next to Pournima, whole sky was glittering due to moonlight. Back to the temple, we had a chat with villager and gathered details about the further journey.


  
Gondhal Function at Zolai Devi Temple

 Zolai Devi Idol

 
 Feasting on Popti

  

Moon was its best, emitting lovely light
We woke up at 6:30 AM, completed morning chores and we started to explore the fort as sun was coming up. You can find two water tank just near Zolai Devi Temple, one of them is potable and there is a beautiful deepmaal in front of the temple. Just near the temple there is Balekilla, which has lot of remnants, well maintained by the villagers with help of local politicians. There are lot of canons on the fort, in the gazetteer it is said that fort has total 23 canons at different spots. Other than this there is a grain storage, lots of water tanks and idols of various dieties. But the cynosure of all is 'Khamb Taaka' which means pillared water tank, to reach it you shall walk straight from door of the temple in east direction and come to a narrow end where you will find a Stone wall of about 5 feet, just on right side of the wall there is a steep path going down. Take care while going down as the path is full of loose soil and slippery grass, villagers advised us not to go that side but we wanted to anyhow see that water tank. At the end we found that if we descend with care, that patch is not much difficult, but still one needs to get down with care. Atlast, our effort was fruitful as we discovered 'Khamb Taaka', pillars of which had beautiful carvings. Happy with our exploration, we came back to temple, collected our bags and got down the fort.

 
Lots of Canons on Rasalgad, Booommm !!!


 
 Storage Structure on Rasalgad

 
Small Devasthan at Rasalgad

 
Khaamb Taaka (Pillared Water Tank)


 
 Zolai Devi Mandir, Rasalgad

Back in our vehicles, our next target were the mighty Mahipat and Sumar Gad. As per our plan, we had to reach Wadi Jaitapur and then walk towards Wadi Beldar. From Rasalwadi, you need to come back to Rasalphata, turn right and after almost 7-8 kms you need to take right again, on every turns there are proper sign boards erected by Tourism board. As per the villager whom we met on Rasalgad, there is a construction of road going on till mahipatgad, only 2 KM is remaining, but the road after Wadi Jaitapur is 'kuccha'. He advised us to proceed ahead of Wadi Jaitapur, till you find road not suitable to go ahead. A kilometre ahead of Wadi Jaitapur we came across an Engineer who was on bike and was working on the road going upto Mahipatgad. He told us that you can go 2 more kms ahead, keep the cars and then proceed to Wadi Beldar by walking. As per his instructions, negotiating steep and not so good road we reached a cliff where road was turning U and ahead of that construction was going on. We parked our vehicles on the cliff, packed our bag and got ready for the climb ahead to Wadi Beldar. We were fortunate enough, as our climb was reduced by almost 1 hour due to the newly constructed road. There are electric poles going from wadi jaitpur to wadi beldar, you have to follow those poles throughout the route.
 
Place where we parked our vehicles, Far ahead in centre you can see Sumargad


  
Steep kuccha road through which we came up from Wadi Jaitapur

After almost 1 and half hour walk under hot sun, we reached Wadi Beldar at Mr. Sitaram Jadhav's(+91 7038923580) house around 12:00 PM, who was going to be our host and guide for next one and half day. We had our lunch at a house nearby made by a nice and warm lady Jijabai, food was awesome and had a motherly touch.
Tummies filled with homemade food, we decided to execute our further plan with a small change. Our original plan was to go to Mahipatgad and stay there for night, but as we had reached Wadi Beldar before expected time, we decided to do the thrilling Sumargad first. At 1:30 PM, leaving our bags behind, we started moving towards Sumargad behind our guide Sitaram Jadhav. If we keep our back towards Wadi Beldar, you need to move left towards south. First 15 mins of the walk towards Sumargad is steep, rest of the 45 mins walk is on ridge and most of the times straight walk. In 15-20 mins, you reach a small house called "Raya Dhangarachi Zhaap", which is small hut of a shepherd called Raya, who has all detailed information about the surrounding areas. We were fortunate to meet Raya and told him that we had read about him in all books and articles, which has mention about these trio forts. You have to walk around 3 hills to get a clear view of Sumargad, enroute we could see our car far away parked on the cliff. By continuously walking, without taking any break you reach 'Gur Khind', from where straight path goes to Rasalgad and left goes to Sumargad. Here you need to take care that, don't take any heavy baggage on sumargad, as the path is very tricky, just take a small bag with you having water, that too we left on a tree near 'Gur Khind'.

 
Raya Dhangarachi Zhap (Shepherd's Hut)

Raya Dhangar with Energy Drink, Sitaram Jadhav with Sickle

 
View of Sumargad after coming up from Gur Khind


 
Way to Sumargad after coming up from Gur Khind


 
Sumargad

 
Really Unbelievable !!! View from Sumargad


 
Need to pass those three hills to come towards Sumargad, far ahead right hand side you can see Mahipatgad

We started ascending the steep path going towards left with all the loose soil you can imagine, while going up we were wondering how we will come down from here while returning. After initial 10 mins climb, you come on the long arm of sumargad and then traverse from the left hand side of Sumargad base takes you to the famous 50 feet rock patch of Sumargad. Just before the rock patch, there is a very tricky traverse which you need to negotiate patiently while keeping utmost balance. While doing this traverse, you need to touch your back completely on the rock and moving inch by inch sideways, maintaining balance you can complete this small but tricky patch.

  
It was that moment when you start to think, better if you had spent weekend sleeping at home
Further you come across the 50 feet rock patch, which is standing almost 90 degree, but there are proper holds at all places. There are two iron ladder (4-5 feet) placed by villagers at 1st and 3rd stage of the patch, also a thick wire runs along the length of patch which acts as a mental support in case you lose balance. If you are new to sahyadris, this patch can be very scary but if you been well acquainted with challenges of sahyadris then this patch is not much to worry about. Our guide Sitaram Jadhav told us to climb the patch without footwear, which will give good grip on flat patches. 1st and 3rd stage of the climb are not much to worry about, but the 2nd stage has some loose rocks, it's better to find a reliable rock to push yourself up or use the wire for support. Ladders placed by villagers are not anchored to the rocks, so everytime someone is climbing on it, other person has to hold it so there is no chance of slipping. Finally at 3 PM we were on the top of fort. There are three huge water tanks in front of the cave which houses a Shiv Temple. Just above the big water tanks there is a small potable water tank, from which you can drink water till heart content, guess it remains throughout the summer season. Top of the fort is a small area, on the southern end you can find a 'Khamb Taaka' (pillared water tank), which is same as Rasalgad but without carvings. Other than this there are few remnants which resemble a storage structure. After half n hour we decided to descend the rock patch, and this time it was more scary than going up as we can see the whole valley just below our feet. By keeping patience and maintaining balance with the help of wire, we successfully descended the rock patch and in 20 mins reached Gur Khind, where we collected our bag and water bottles.
  
Start of the rock patch at Sumargad, you can see a black wire hanging which is for support

Rock patch at Sumargad




Descending the Rock Patch at Sumargad


 
Water Tanks at Sumargad, one above these water tanks is potable 

 
Potable Water Tank at Sumargad

 
Idols on Sumargad

Khamb Taaka at Sumargad

Further we descended to a small water stream near Wadi Beldar, where we had a good bath and spent a great time. Some of our group members were murmuring that we can now leave for Mahipatgad, which is 1 hour from Wadi Beldar and stay there for night. But atlast we decided to stay in Wadi Beldar and explore Mahipat next morning. After having dinner at Jijabai's house, we retired for the day in Sitaram Jadhav's house. You can find mobile range in whole region of this trio forts, which is very surprising because it was a remote area and to just go for shopping you have to walk for 3 hours to Wadi Jaitpur. Well, I guess the region is only 20 kms radius of Khed, so there is no problem of mobile network.
On 25th Jan morning, we woke up late than planned as everybody was exhausted from previous day's hike. Nonethless, we started for Mahipatgad at 8:30 AM, our guide Sitaram Jadhav was suppose to take a different group to Sumar and Rasal, so he showed us the path and asked us to follow the electric poles right upto the Pareshwar Mandir, right in the centre of Mahipatgad. Mahipatgad is all covered with forest and villagers say that wild animals like Leopard, Wild cats, Wolves roam around the fort in broad daylight. Every year Mahipat gets a government grand of 5 lakh rupees, which is very less as compared to the rich heritage it carries which needs to be conserved. In one hour you can reach Pareshwar mandir from Wadi Beldar, enroute we came across a fort wall towards left, one stone dam after that and a big well on right side. Just before the stone dam, we met the Pujaari (priest) of Pareshwar Temple, he was hurriedly descending the fort as he wanted to leave for Mumbai. He gave us some information about the fort and what all you can find on it. Priest told us there are lot of things to see on the fort, there are 360 small temples and idols scattered all over the fort, also there are remnants and fortifications, but most of them are covered in dense forest and difficult to find. He also warned of us getting lost in the dense forest, as a suggestion he told that at every diversion you leave a mark as you go ahead, so it will help when you turn back.
 
 Stone Dam at entrance of Mahipatgad

The area around Pareshwar Mandir is one of the beautiful places I have seen. Just in front of the temple, there is a huge well, which has the most sweetest and coolest water you can ever imagine. There are lot of different butterflies and birds you can spot on the fort roaming freely in the wild. After seeing the temple, we wished we could have hiked the fort last evening and stayed in the temple. Temple is very spacious and accommodate around 30 people comfortably.

Pareshwar Temple, Mahipatgad
 

Mahipatgad

 
Mahipatgad
After few minutes, we decided to explore the fort on our own, but as Mahipatgad is spread over 120 acres that too in thick jungle, exploring the fort was a real challenge. Not to get lost in the forest, we decided to stick together and move in one direction, till we find a dead end or a valley or a fort wall. We decided to move in northern direction, enroute we saw some structures, idols and broken fort wall. After around 20 mins of walking and making marks on every diversion, we reached a cliff which was northernmost end of the fort. View from that place was mesmerizing and till today whenever I think of Mahipatgad, the view comes in front of my eyes. On the left hand side of the cliff, you can see two fort towers indicating the fort boundary. The fort is so huge that you cannot accommodate its expanse in just one view. On the cliff we had lot of photography. Far ahead on the right, we could see Mahabaleshwar table land and somewhere towards left of that you can see the entire range of Rajgad, Torana and Raigad. If we turn back, we can see Vasota fort, which is near Chiplun. You should be fortunate enough to get a clear sky like we had that day to spot all those forts from Mahipatgad. After spending half n hour on the cliff, we made our way back from the forest and came back to Pareshwar Mandir. Enroute we saw some excreta of Leopard and thus our return journey was far more quick.

 
Walking through dense jungle at Mahipatgad



And jungle opened up for a beautiful view at Mahipatgad



View from northern end of Mahipatgad




 
At left, you can see two fort towers from the northern tip of Mahipatgad

As you make way back to the stone dam, just after the temple there is a good path going towards right, some of our group members decided to give a try in pursuit of finding something new and some were skeptical because of getting lost in the jungle. Atlast, we went ahead on that path, which actually moves parallel to the normal path going towards the stone dam. After 5-10 mins, the path started descending and we met a villager who confirmed that same was going to Wadi Beldar but different than one we climbed up. This path led us to the fort tower which we could see on the left hand side while climbing up. Enroute we saw small idols and to our surprise canon balls were kept there, it was a pleasant discovery as it was not mentioned anywhere in the information we studied. After spending few minutes at tower, we started descending and further that path met the path by which we had climbed the fort just below the stone dam.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...