महाराष्ट्राच्या भुगोलाचा विचार केला तर उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगेने दोन प्रादेशिक विभाग पडतात.समुद्रसपाटीला असलेला कोकण आणि तीनशे ते सातशे मीटर उंचीवर पसरलेला घाटमाथा.याच्यामध्ये एखाद्या संरक्षक भिंतीसारखा सातशे ते हजार मीटर सह्यपर्वत पसरला आहे.सह्याद्री पर्वताला पुर्व बाजुला सेलबारी-डोलबारी,हरिश्चंद्र -बालाघाट्,सातमाळा,शंभु महादेव अश्या उंच आणि लांब पसरलेल्या डोंगररांगा जोडल्या गेल्या आहेत.कोकणात मात्र अपवाद म्हणून ३००० फुट आणि अधिक उंचीच्या दोनच रांगा आहेत.रायगड जिल्ह्यात कल्याण-पनवेल जवळ प्रबळगड-माथेरान सामावणारी डोंगररांग आणि रत्नागिरी जिल्ह्यात खेडजवळ रसाळ-सुमार -महिपतगड यांना कवेत घेउन दक्षिण-उत्तर धावणारी रांग्,याच रसाळ-सुमार-महिपत या दुर्गत्रिकुटाची आपण माहिती घेणार आहोत.पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंद गड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे.


यातील पहिला गड आपण पायाळायचा आहे तो रसाळगड.नावाप्रमाणेच रसाळगड आपल्याला दुर्गभ्रमणाच्या वीर रसाचा पुरेपुर आनंद देतो.गड छोटा असला तरी भरपुर अबशेष आणि निगराणी राखल्यामुळे रसाळगडाला भेट देणे हे प्रत्येक दुर्गभ्रमण करणार्याचे कर्तव्यच आहे.
गडाचा इतिहास मोठया प्रमाणावर उपलब्ध नाही. रसाळगड तेराव्या शतकात बहामनी राजवटीत बांधला अन् १६६०च्या कोकण मोहिमेत रसाळ-सुमार-महीपत हे दुर्गत्रिकुट शिवरायांनी स्वराज्यात आणलं. सन १७०४ मध्ये महिपतगडाबरोबरच सिध्द्दीने रसाळगड घेतला असण्याची शक्यता आहे.पुढे सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांनी रसाळगड घेतला. नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रे कडून सर्व किल्ले घेतले पण रसाळगड मात्र राहिला. पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड मराठयांच्या ताब्यात आला. नेहमीप्रमाणे १८१८ मध्ये इंग्रजाच्या हवाली झाले असावेत. अर्थात गडावरचे खांब टाके आणि परिसरात असणारी खेडची बौध्द लेणी,हातलोट घाट हे सर्व ध्यानी धरता रसाळगड प्राचीन आहे असे म्हणायला वाव आहे.कदाचित गडाची उभारणी तिसर्या ते पाचव्या शतकात झाली असावे असा अंदाज बांधता येतो.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई-गोवा रस्त्यावरील खेडच्या भरणा नाक्यापासून १८ कि.मी.अंतरावर रसाळगडाचा पायथा आहे. रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत जायला पक्का रस्ता असून किल्ल्याच्या पायऱ्याजवळ गाडी लावता येते. इथून थेट माथ्याकडे जायची वाट लागते.
१) वाडीबीड गावातून :-
खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणार्या हुंबरी फाट्यावर उतरायचे. हुंबरी फाट्यापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणत: बीड गावात पोहोचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.
२ रसाळवाडी मार्गे:-
खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गे किल्ला गाठता येतो. वाट अत्यंत सोपी आहे.
खेड ते रसाळगड
सकाळी ११.३० व दुपारी ३
३ मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गे :-
खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस टी पकडावी. मौजे जैतापूरहून रसाळवाडी मार्गे दोन तासात रसाळगड गाठावा. वाट अत्यंत सोपी आहे.
खेड ते वाडी जैतापुर
९.३०,११.४५,५.४५ ( मुक्कामी )
वाडी जैतापुर ते खेड
६.४५,९.४५,१.००
जावळीच्या खोऱ्यात वसलेल्या या दुर्गत्रिकुटाची भटकंती म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव. या त्रिकुटातील रसाळगड हा किल्ला दक्षिणेला सर्वात शेवटी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अवशेषसंपन्न गिरीदुर्गांत रसाळगडाचा क्रमांक सर्वात वर लावता येईल इतके अवशेष या गडावर आहेत. दक्षिणोत्तर पसरलेल्या या गडाचे क्षेत्रफळ साधारणपणे २७ एकर इतके असुन गडाची उंची समुद्रसपाटीपासून १७४० फुट तर पायथ्यापासून १२०० फुट आहे. मुंबई-गोवा रस्त्यावरील खेडच्या भरणा नाक्यापासून १८ कि.मी.अंतरावर रसाळगडाचा पायथा आहे. रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत जायला पक्का रस्ता असून किल्ल्याच्या पायऱ्याजवळ गाडी लावता येते. इथून थेट माथ्याकडे जायची वाट लागते. नुकत्याच बांधलेल्या या पायऱ्यांच्या सुरवातीला एक प्लास्टिकची पाण्याच्या टाकी असुन या टाकीत गडावरील पाणी नळाने खाली आणुन ते गडाखालील घेरा रसाळगड वाडीत पुरवलेले आहे. महीपत-सुमारगडावरून येणारी वाट या खिंडीतच रसाळगडला मिळते. इथून किल्ल्याकडे नजर टाकली की किल्ल्याचे दोन दरवाजे नजरेस पडतात व रसाळगडचे सुंदर दर्शन होते.



गडाच्या पहिल्या दरवाजाच्या उजव्या बाजुस एक नैसर्गिक बुरुज आहे. टाकीपासून पुरातत्त्व खात्याने अलीकडेच बांधलेल्या पाय-यांच्या वाटेने आपण वीस मिनिटात गडाचे तीन दरवाजे पार करून माथ्यावर दाखल होतो. गडाच्या पहिल्या दरवाजा बाहेर डाव्या बाजूस एक छोटीशी वाट गेली आहे. या वाटेने गेल्यास आपल्याला तटाबाहेरच एक भुमिगत टाके व टेहळणी करणाऱ्याला बसण्यासाठी खडकात खोदलेली खोली पहायला मिळते.
रसाळगडावरच्या मारुतीचे मुळ अवस्थेतील मंदीर
मारुती मंदीराचा जीर्णोध्दार झाल्यावर
गडाच्या पहिल्या दरवाजातून आत आल्यावर दुस-या दरवाजाकडे जाताना वाटेत मिशा असलेल्या आणि कमरेला खंजीर लावलेल्या मारुतीचे शिल्प पहायला मिळते. येथुन पुढे जाताना एका पायरीवर विरगळ शिल्प आढळून येते.
थोड पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. गडाखालुन टोकाला दिसणारा तो हाच दरवाजा असुन दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस वर दरवाजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत.
येथुन पुढील भागात गडाचा पुर्णपणे उध्वस्त झालेला तिसरा दरवाजा असुन या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते तर उजव्या बाजुस साचपाण्याची तीन टाकी दिसुन येतात.
या किल्ल्याला राज्य स्मारक घोषित केल्या नंतर दुर्गाचे सुशोभिकरण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात निधी आला होता. परंतु या निधीचा संबंधित विभाग व ठेकेदारांनी गैरवापर करुन रसाळगड दुर्गाचे विद्रुपीकरण करण्यात आल्याने रसाळगड किल्ल्याचे वैभव झाकोळले गेले होते. मात्र याबाबत शिवप्रेमी, गडकोट संघटना, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सारख्यांनी या किल्ल्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्याकरीता लावलेला जनरेटा यामुळेच सद्यस्थितीत या किल्ल्याला सुस्थिती प्राप्त झाली आहे. विकास कामांचा निधी कोटीच्या कोटी खर्ची पडून देखील या किल्ल्याची अजूनही सुशोभिकरण करण्यात न आल्याने ते नेमके होणार तरी कधी? हाच यक्ष प्रश्न दुर्ग प्रेमींना सतावत होता.
दरम्यान, किल्ले रसाळगडावर शिवकालीन असलेल्या तोफा आजही अस्तावस्त किल्ले परिसरात आढळून येतात. त्यापैकी काही तोफा गडकोट प्रेमींनी एकत्र ठेवल्या आहेत. मात्र बुरूजावर असलेल्या अनेक तोफा जाग्यावरच नसल्यामुळे त्यांची व्यवस्था लावण्याची आर्त मागणी गडकोट प्रेमींमधून होत होती. अखेर पुरातत्व विभागाने याबाबत तोफा सुरक्षित होण्याच्या दृष्टीने पावले उचलत तोफांभोवती गाडे तयार करण्यात येणार आहेत

रसाळगडाचा नकाशा
दरवाजाच्या उजव्या बाजुस असणारा बुरुज पीरबुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावर एक कबर असुन या कबरीला लागुनच एक उध्वस्त मुर्ती ठेवली आहे व शेजारी एक तोफ पडलेली आहे. या बुरुजावरून रसाळगडाचा प्रचंड विस्तार नजरेस पडतो. संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच आहे.
गडाच्या तटबंदीवर फेरी मारताना ठिकठिकाणी तटावर व बुरुजावर तोफा पडलेल्या दिसतात. गडावर पसरलेल्या लहानमोठया १६ तोफा हे या किल्ल्यांचे वैशिष्ट आहे. यातील काही तोफांवर इंग्रजी अक्षरे व चिन्हे कोरली आहेत. गडाच्या मध्यभागी अलीकडील काळात जीर्णोद्धार केलेले झोलाई देवीचे मंदिर आहे. पीरबुरुजावरून झोलाई मंदिराकडे जाताना दोनही बाजुस ढासळलेली तटबंदी,घरांचे अवशेष, साचपाण्याची टाकी व काही तोफा दिसुन येतात.
जीर्णोध्दार होण्यापुर्वीचे झोलाई मंदीर
झोलाई देवीचं कौलारू राउळ मुक्कामास अतिशय उत्तम!

गाभा-यात झोलाई देवीची मुर्ती आहे. वीज आहे. देवीची त्रैवार्षिक यात्रा असते.
मंदिरामागे किंचित उंचवट्यावर राजवाडा अन् बुरुजांची महिरप आहे.
देवळाजवळ पिण्याच्या पाण्याची २ तळी अन् पल्याड एक धान्याचं कोठार आहे. पावसा-पाण्यात गावकरी गुरं बांधत असल्यानं, राहण्याच्या दृष्टीनं यां वास्तूचा फारसा उपयोग नाही.
मंदिरासमोरच दिपमाळ आहे, त्याच चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे, एक लहान तोफही ठेवलेली आहे. जवळ एक चूल मांडलेली दिसते. जवळच लाकडे आहेत. दीपमाळे जवळच तुळशीवृंदावन आणि एक तोफ ठेवलेली आहे. तसंच मंदिराच्या कठड्यावर अजून एक तोफ ठेवलेली आहे. मंदिर झोलाई देवीचे असले तरी अजूनही देव त्यात आहेत. मंदिराच्या आतमध्ये जमवलेल्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत. शिवाजी महाराजांची वस्त्र नेसवलेली मुर्तीही आहे.
मंदिराच्या समोरील भागात जुन्या मंदिराचे लाकडी कोरीवकाम असलेले खांब पहायला मिळतात. मंदिराच्या आतील कोनाड्यात अनेक सापडलेल्या मुर्ती ठेवल्या आहेत. मंदिराचा गाभारा दगडी बांधकामात असुन त्यात झोलाई,वाघजाई व भैरवाची मुर्ती आहे. रात्रीच्या मुक्कामास हे मंदीर उपयुक्त आहे.
मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. मंदिराच्या आवारात दोन लहान तोफा, सतीशीळा व काही प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. मंदिराच्या मागील बाजूस एक गणपतीची घुमटी असुन यातील गणपतीची मूळ मुर्ती भग्न झाल्याने घुमटीच्या मागील बाजुस ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याची दोन मोठी तळी असुन यातील एका तळ्यात पिण्यायोग्य पाणी वर्षभर असते. मंदिरामागे पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा असलेला १४० x १७० फुट आकाराचा ६ बुरुजांचा बालेकिल्ला आहे.
रसाळगडावरचे उध्वस्त शिवमंदीर
बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा ढासळलेला असुन तुटलेल्या तटबंदीतुन आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. बालेकिल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीत एक लहानसा दरवाजा आहे.
बालेकिल्ल्याच्या एका बुरूजावर ३ तोफा असुन आतील भागात वाड्याचे व सदरेचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्याच्या बाहेर उत्तर दिशेला पाण्याची चार टाकी तर मागील पठारावर अजुन एक मोठे तळे आहे. या पठारावर एक तोफ असुन घरांचे विखुरलेले अवशेष दिसतात. पठाराच्या टोकाला माचीपासून किंचित सुटावलेला एक बुरुज आहे. इथुन गडाच्या दक्षिण दिशेला असलेल्या माचीकडे निघाल्यावर सर्वप्रथम कातळात कोरलेली तटाबाहेर जाणारी वाट दिसते. हा गडाचा दुसरा दरवाजा अथवा चोरवाट असावी.
येथून पलीकडे एक दगडी बांधकामातील २० x ६० फुट आकाराचे तीन दरवाजाचे चांगल्या अवस्थेत असणारे कोठार दिसते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. कोठाराच्या दोन दरवाजाच्या दगडी चौकटीत वरील बाजुस गणपतीचे तर खालील बाजुस मानवी मुख व नक्षी कोरलेली आहे. मंदिराशिवाय येथे देखील ५० माणसे सहज राहु शकतात. या कोठाराच्या आवारात एक तुटलेली तोफ जमिनीत उलटी पुरलेली दिसुन येते. तोफेशेजारी काही वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत.
येथुन थोड पुढे गेल्यावर माचीच्या उजव्या बाजुला थोडेसे खाली उघड्यावर एक शिवलिंग व नंदी तसेच झिजलेलं गजलक्ष्मी शिल्प दिसुन येते. येथुन पुढील वाट आपल्याला माचीच्या टोकावर घेवून जाते. जाताना वाटेत पाण्याची टाकी व काही वीरांच्या समाध्या दिसतात. माचीच्या दक्षिण टोकाला एक भक्कम बुरुज असुन इथून एक सोंड खाली उतरते.
या सोंडेखाली एक खांबटाके असुन तिथपर्यंत जायचा रस्ता खूप अवघड आहे. इथे आपली गडप्रदक्षिणा पुर्ण होते. संपूर्ण गडफेरीस दोन तास लागतात. किल्ल्याच्या माथ्यावरून पश्चिमेकडे पालगड व मंडणगड,महाबळेश्वरच्या डोंगररांगा, सुमारगड आणि महिपतगड. इशान्येकडे मकरंदगड तर आग्नेय दिशेला वासोटा व नागेश्वराचे सुळके इतका मोठा प्रदेश नजरेस पडतो.
गडावर असणारे तीन मोठे तलाव, सात मध्यम आकाराची टाकी व दहाबारा लहान टाकी तसेच गडावर मोठया प्रमाणात विखुरलेले अवशेष यावरून गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. पुरातत्त्व खात्याने गडावर बरीच डागडुजी केली आहे. बालेकिल्ला आणि झोलाईदेवी मंदिर यामध्ये असलेले दोन्ही तलाव तसेच गडावर येणाऱ्या पायऱ्या बांधून काढल्या आहेत.
रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास लागतो.तोफांचा किल्ला’ असा उल्लेख ज्या किल्ल्याचा केला जातो तो हा रसाळगड तोफांच्या अभ्यासकांनी आवर्जून बघावा असाच आहे.अर्थात या परिसरात येणे तसे दुर्गम असल्यामुळे केवळ रसाळगड न बघायला येता रसाळ्,सुमार आणि महिपत या दुर्गत्रिकुटाला भेट देण्याची योजना करुनच या भागात यावे.यातून कोकणातील सह्याद्रीच्या खडतर चढाईचा अनुभव या आयुष्यभर लक्षात रहावा असा अनुभव देउन जाते.
संदर्भग्रंथ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा-सतिश अक्कलकोट
५) हे ब्लॉग
६) www.durgbharari.in हि वेबसाईट
७) www.trekshitiz.com हि वेबसाईट
खेड ते रसाळगड
सकाळी ११.३० व दुपारी ३
खेड ते वाडी जैतापुर
९.३०,११.४५,५.४५ ( मुक्कामी )
वाडी जैतापुर ते खेड
६.४५,९.४५,१.००
खेड ते दहिवली ( घोगरा )
९.३०,१२.२०,२.३०
 |
| सुमारगड |
‘रसाळ–सुमार–महीपत’
ह्या किल्ल्यांची रांग सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर अशी
दक्षिणोत्तर, पण स्वतंत्रपणे धावते. खरी मज्जा आहे, जर हे ३ किल्ले
सुट्टे-सुट्टे न बघता, एका सलग डोंगरयात्रेमध्ये धुंडाळायचे, पुढे ‘जगबुडी’
नावाच्या भीतीदायक नावाच्या नदीच्या चिंचोळ्या खो-यात उतरायचं, अन्
मधु-मकरंदगडाजवळच्या हातलोट घाटानं सह्याद्री माथा गाठायचा. ३-४ दिवसांचा
‘क्रॉसकंट्री’ ट्रेक मारायचा बेत आखला.

नावाप्रमाणे अत्यंत रसाळ अनुभूती देणारा रसाळगड
रसाळगडावरून
लांबवर का होईना, पण सुमारगड अन् महिपतगड दर्शन तरी देतील, हा अंदाज साफ
फसला. उद्याचा सुमारगडाकडचा प्रवास खडतर असणार, याची नांदी दिली
उत्तरेकडच्या उत्तुंग धारेनं. असू दे, याचा नंतर विचार करू, असा विचार करून
पुढे निघालो.

माथ्यावरच्या
गवताळ पठारावरून ५ मिनिटात झोलाई देवीचं कौलारू राउळ गाठलं. कौलारू मंदिर,
जवळची पाण्याची टाकी, दीपमाळ अन् पाठीमागची सुमारगडाकडे झेपावलेली
डोंगररांग असं सुरेख दृश्य!
गडाच्या
पाच एकर माथ्यावर भरपूर अवशेष आहेत. रसाळगड तेराव्या शतकात बहामनी राजवटीत
बांधला अन् १६६० च्या कोकण मोहिमेत रसाळ-सुमार-महीपत हे दुर्गत्रिकुट
शिवरायांनी स्वराज्यात आणलं. (संदर्भ: सांगती सह्याद्रीचा)
दक्षिण
टोकापर्यंत हुंदडून आलो. गडापासून सुटावलेल्या टेपाडापलिकडे जगबुडी नदीच्या
खोरं अन् मागे सह्याद्रीच्या मुख्य रांगेत पर्वत अन् महिमंडणगडाची टोकं
खुणावत होती.

तर
उत्तरेला पहिल्यांदाच झाडीभरल्या उभ्या डोंगररांगेमागे सुमारगडाचा
कातळमाथा डोकावला. महिपतगड त्याच्याही मागे आडवा-तिडवा पसरला असावा.
वैशिष्ट्यपूर्ण आकार काही जाणवला नाही.

रसाळगडाच्या
दूरवरच्या दक्षिण टोकापासूनंच फक्त सुमारगडाचा माथा दिसतो, त्याच्या हा
क्लोज-अप. उद्याच्या चढाईचे वेध लागू लागले होते...

परत मंदिराकडे येताना एका लवणात काही समाध्या दिसल्या. कोण-कुठल्या आयुष्यांच्या कथा इथल्या हवेत रुंजी घालत असतील, असं वाटून गेलं.

उघड्यावर झिजलेलं गजलक्ष्मी शिल्प विखुरलेलं, तर पल्याड शंकराची पिंड उघड्यावर तापत होती..
विखुरलेले अवशेष बघून थोडं उदास वाटू लागलं, पण सभोवतालच्या रानव्यानं दिठी सुखावली.

गडावर शोधत गेल्यावर तब्बल १६ तोफा मोजल्या. काहींवर पोर्तुगीज/ इंग्रजी अक्षरे चिन्हे आहेत.
संध्याकाळचा
गार वारा सुटला, अन् सूर्य पश्चिमेला कलला. रसाळगडानं थोडक्या वेळात
आपलंसं करून टाकलं होतं. गडावर आज माजलीये फुटकळ झुडुपांची दाटी,
अस्ताव्यस्त विखुरलेले दगड अन् भणाणणारं मोकाट वावटळ.. पण, गडावरची जोती,
दरवाजे, समाध्या, तोफा, बुरुज, टाकी यांच्या पोटात दडलीयेत इतिहासाचे
चढ-उतार, आनंद-उल्हास, जय-पराजयाची कित्येक हसू अन् आसवं.. आज मौनात
गेलेल्या या भग्न अवशेषांचे पोवाडे गायचं कवित्व मात्र आपल्याकडे नाही,
याची ‘हुरहूर’ वाटते... कधीतरी अलगद सूर्यास्त झाला..

पहाटेच्या
थंडीत आलं-वाल्या स्पेशल चहाचे घुटके घेताना, पूर्वेला सह्याद्रीच्या
धारेनं लक्ष वेधलं. तलम ढगांची पुसट रांगोळी कोवळ्या सूर्यकिरणांच्या
चाहुलीनं लाजून रक्तवर्ण होवू लागली.

सह्याद्रीत
भटकताना गड-किल्ल्यांवर मुक्काम नेहेमीच आनंद देणारा, पण ‘रसाळगडा’वर
काहीतरी वेगळी जादू आहे. इथला मुक्काम नितांत सुंदर, उच्चकोटीचा, प्रसन्न
अन् अवश्य अनुभवावा असा!!!

सुमारगडाकडे दमदार चढाई
रसाळवाडीतून रसाळगडाला ‘अलविदा’ करताना खूपंच जीवावर आलं. पण चाहूल लागली होती ट्रेकच्या पुढच्या आव्हानात्मक टप्प्यांची.
रसाळवाडीतून शेताडीतून उत्तरेला निघाल्यावर, धारेवरून वरचं पठार गाठण्याच्या ऐवजी, डावीकडून (बाण बघा) आडवं गेलो.
गेलो.

२०-२५ मिनिटं आडवं गेल्यावर उजवीकडे उभं चढून धारेवर पोहोचलो.

गवताळलेल्या धारेवरून मागं बघताना रसाळगड मागे दूर जाऊ लागला.

धारेवरची उभी वाट घामटं काढू पाहत होती.

वाटाड्या
‘दगडूभाऊ’ हा फारंच अवली माणूस निघाला. आम्ही २ मिनिटं विश्रांती घ्यायला
लागलो किंवा चौकसपणे एखादा प्रश्न विचारायला गेलो, की संपलंच... पुढची १०
मिनिटं दगडू-महाराजांचं भाषण सुरू.. अन् ते घसरणार मूल्यशिक्षण अन् जगात
कशी वाईट लोकं आहेत, याच विषयावर.. फूल करमणूक!!! दगडू चलाख आहेच, पण
गंमतीचा भाग सोडला तर या भागाची उत्तम माहिती असलेला वाटाड्या आहे.

वाट घसरड्या अरुंद आडव्या वाटेवरून जाऊ लागली. दरी खोलावत जात होती, तर रसाळगड झपाट्यानं मागे पडत होता.


शांतपणे दम टिकवून एक-एक पाऊल टाकत आम्ही अधिकाधिक उंची गाठत होतो.

गवताळ
मुरमाड घसरडे डोंगरउतार चढत होतो, म्हणून बरे होते. हाच ट्रेक उलट्या
दिशेनं केला असता, तर उतरायला जास्त त्रास झाला असता हे नक्की.

माथ्यापर्यंत
न चढता अखेरीस वाट उजवीकडे पदरातल्या झाडीत लपलेल्या धनगरवाड्यापाशी आली.
रसाळवाडीपासून इथं पोहोचायला १.५ तास लागले होते. अश्या दुर्गम जागी धनगर
त्यांच्या गायी-म्हसरांबरोबर कसे टिकून राहत असतील, ही खरंच कमाल आहे...
धनगरवाड्यापासून पहिल्यांदा जवळून दिसला ‘सुमारगडा’चा कातळमाथा.

धनगरवाड्यापासून झाडीतून आडवं जात सुमारगडाच्या जवळ जावू लागलो
No comments:
Post a Comment