Monday, January 3, 2022

जैन लेणी हत्तीखाना

    मराठवाडा म्हणजे संतांची आणि साहित्याचा वारसा लाभलेली भूमी. पाण्याच्या अभावामुळे दुष्काळी अशी ओळख सध्या असली तरी या भुमीला मोठा इतिहास आहे. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे.अंबाजोगाई हे यादवकालीन ‘आम्रपूर’ मोठे संपन्न नगर म्हणून प्रस्थापित पावले होते. हा विकास अकराव्या शतकापासून सुरू होऊन सिंघन राजाचा प्रसिद्ध आणि पराक्रमी सेनापती, खोलनायकाच्या वास्तव्य काळापर्यंत झालेला दिसतो व ती प्रांतिक राजधानी म्हणून मान्यता पावलेली दिसते.  भौगोलिक परिस्थितीने सुसज्ज असल्याने इतिहासात सातवाहन, चालूक्य, यादव, बहामनी, राष्ट्रकूट घराण्यांचे अंबाजोगाई आणि पर्यायाने बीडमध्ये प्रस्थ होते. राष्ट्रकूट काळात कर्नाटक, आंध्रप्रदेशात व्यापारासाठी अंबाजोगाई शहराचे महत्व होते. याच्या खुणा येथील डोंगरात लेण्यांच्या रुपात पाहायला मिळतात. मात्र या लेण्यांची माहिती वा नोंद देखील राज्य पुरातत्व विभागाकडे नाही. हा प्रदेश २२४ वर्ष निजाम राजवटी खाली राहिल्याने मराठ्यांच्या आणि भारताच्या इतिहासात काहीसा दुर्लक्षित राहिला. अंबाजोगाईचे  निजामी अमलातील नाव होते ‘मोमिनाबाद’. अंबाजोगाई अथवा योगेश्वरी हे प्राचीन व इतिहासप्रसिद्ध स्थान बालाघाट डोंगराच्या दक्षिणेस, घोडदरीत जयंती नदीवर वसले आहे. येथील हवा कोरडी व समशीतोष्ण आहे. येथील सर्वांत जुना उपलब्ध शिलालेख १२४० मधील सिंघण यादवाच्या कारकीर्दीतला आहे. यादववंशीय जैत्रपाळ राजाची गढी (सध्याचा शहाबुर्झ) सु. ७०० वर्षोपूर्वीची आहे. यादवकालात या नगरीची विशेष भरभराट झाली. चक्रधाराच्या तिर्थयात्रेत ज्या‘खोलानायकाचे आंबिया’ चा उल्लेख आहे, त्या सिंघण यादवाच्या सेनापती खोलेश्वराचा शिलालेख येथील चोभाऱ्याच्या गणेश मंदिरात आहे.
                बाण गंगेच्या तीरी | मनोहर अंबानगरी |
    असा उल्लेख मुकुंदराजांनी विवेकसिंधुच्या अठराव्या अध्यायात केला आहे.तसेच पंढरपुरच्या प्रसिध्द अश्या चौर्यांशीच्या ( शके ११९५ म्हणजे १२७३ सन ) शिलालेखात अंबे गावाचा उल्लेख आहे.आनंद रामायणात योगेश्वरी मरामंबा, दृष्टवा ह्यंबापुर स्थिताम | असा अंबाजोगाईचा उल्लेख आहे.शके १०६६ ( सन ११४४) मध्ये उद्यादित्य राजाच्या काळात असणार्‍या योगेश्वरी मंदीराचा शके ११५० ( इ.स. १२३८) मध्ये खोलेश्वराने जीर्णोध्दार केला.खोलेश्वर प्रशस्ती मधील अंबानगरीच्या वर्णनात योगेश्वरी मंदीराबरोबरच केदारेश्वर, अमरेश्वर्,माणकेश्वर, सकळेश्वर, लंबोदरालय अशा इतर मंदीराचा स्पष्ट उल्लेख आहे.'योगेश्वरी महात्म्य' या ग्रंथात देखील या क्षेत्राची माहिती उपलब्ध आहे. ज्ञानेश्वरांनी येथील मुकुंदराजाच्या समाधीला भेट दिल्याचे नमूद आहे. सोळाव्या शतकात दासोपंतांनी व सतराव्या शतकात कृष्णदयार्णवांनी येथे ग्रंथनिर्मिती केली. समर्थ रामदासांनी या तीर्थाची यात्रा केली होती. यादव काळानंतर अवघा महाराष्ट्रच मुसलमानी सत्तेच्या दावणीला बांधला गेला.यादवांनंतर वेगवेगळ्या इस्लामी अमलाखाली असलेल्या याच ठिकाणी विसाव्या शतकात स्वामी रामानंद तीर्थांनी निजामशाहीविरूध्द स्वातंत्र्यसंग्रामाची मुहूर्तमेढ प्रथम रोवली. 
  आजचे आंबेजोगाई शहर नदीच्या पूर्व-पश्चिम तीरांवर वसले असून त्यात शासकीय कार्यालये व शिक्षणसंस्था यांखेरीज योगेश्वरीचे मंदिर, दासोपंतांचे देवघर, खोलेश्वर, अमलेश्वर, चोभारा गणेश इ. देवळे व गावाबाहेरची लेणी ही प्रक्षणीय आहेत.पुढे १९६० साली महाराष्ट्रात समावेश झाल्यानंतरही भौगोलिक रचनेनुसार सत्तेचे केंद्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रापासून दूर असल्याने हा भाग उपेक्षितच राहिला. त्यामुळे मराठवाड्यातील औरंगाबादचा परिसर पर्यटनाची राजधानी मानला गेला तरी बाकिच्या मराठवाड्यातील इतर पर्यटन स्थळे आजही महाराष्ट्राच्या इतर भागातील लोकांसाठी काहीशी अपरिचितच आहेत.
    मराठवाड्यात अंबाजोगाई हे एक असे शहर आहे ज्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्याचाही वारसा लाभलेला आहे. मराठीतील आद्यकवी मुकुंदराज हे अंबाजोगाईचेच. त्यांची समाधी या शहरांमध्ये आहे. अंबाजोगाई हे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. आपण पुणे किंवा मुंबईवरून या शहराला भेट देण्यासाठी येत असाल तर जवळचे रेल्वे स्थानक परळी-वैद्यनाथ आहे. तसेच लातूर या जिल्हा स्थानापासूनही अंबाजोगाई फक्त ५० किलोमीटर दूर आहे. या शहरातील योगेश्वरी देवी म्हणजे बहुतांश कोकणस्थांची कुलदैवत. कोकण विभागापासून अंबाजोगाई बरेच दूर असले तरीही कोकणी लोक आवर्जून या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. योगेश्वरी देवीचे मंदिर साधारणतः ७०० वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. याच देवीच्या संदर्भात एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ अंबाजोगाई शहरामध्ये आहे. हे पर्यटन स्थळ म्हणजे हत्तीखाना लेणी.
हत्तीखाना लेण्यांची  माहिती घेण्यापुर्वी आपण आंबाजोगाईतील योगेश्वरी देवी आणि परिसराची माहिती घेउया.
अंबाजोगाई येथील योगेश्वरी माता :-
    अंबेजोगाई किंवा अंबाजोगाई हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. यास प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंतीनगर म्हणून ही ओळखले जाई. हे गाव जयवंती नदीच्या काठावर वसलेले आहे.
या गावाचे नाव, येथे अवतरित झालेल्या देवी पार्वतीच्या (अंबा बाई) व तिचे येथेच माहेर असल्यामुळे (जोगाई) असे एकत्रित होऊन झालेले आहे. अंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. श्री योगेश्वरी ही अंबाजोगाईचे एक भूषण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून तिच्या दर्शनासाठी यात्रेकरूंची सारखी रीघ लागलेली असते. येगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून कोकणस्थ कुटुंबे भक्तिभावाने तिचे दर्शनास येत असतात. अंबेजोगाई येथील हे योगेश्वरी देवीचे भव्य मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे.
योगेश्वरी देवीचे मंदिर, मंदिर परिसर व इतर मंदिरं :
     या मंदिराची रचना हेमाडपंती स्थापत्यशैलीची असून मंदिर उत्तराभिमुख आहे. मुख्य मंदिर दगडी असून, एका छोट्या गभाऱ्यात चबुतऱ्यावर अंबिकेचा मुखवटा आहे आहे. योगेश्वरीची मूर्ती शेंदरी असून तिचे रूप आक्रमक आहे. देवी उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या सभामंडपात गणपती आणि देवीची उत्सवमूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर उत्तर दिशेस होमकुंड असून, उत्सवाच्या दरम्यान होणाऱ्या शतचंडीचा होम केला जातो. मंदिर परिसरात नगारखान्याजवळ दांतसुराची मूर्ती आहे.

मंदिरावर पाच मजली कळस आहे. उत्तम कलाकृती असलेला मराठा शैलीतील या कळसावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अठरा हातांच्या गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती, ही एक अद्वितीय गोष्ट कळसावर आहे. हा कळस पाच माजली असून याची उंची सत्तर फुट आहे. पहिल्या मजल्यावर चारही बाजूंनी रामायण, महाभारतातील निवडक प्रसंग असून दुसर्या मजल्यावर श्री योगेश्वरी देवीचे व्दादश अवतार कोरलेले आहे. तिसर्या मजल्यावर दशावतार चौथ्या मजल्यावर नवग्रह आणि पाचव्या मजल्यावर सप्तॠषी विराजमान झालेले आहेत. असे हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांनी चितारलेले आणि अप्रतिम कलाकुसर असलेले शिखर आहे.
देवळास चहू दिशेस महाद्वार आहेत. मंदिरासमोर दोन दिपमाळा आहेत. मंदिराचे बांधकाम व त्यावरील शिल्पाकृती पाहून मन थक्क होते. दगडी खांब व तुळयांवरील बारीक नक्षीकाम अतिशय रेखीव आहे. उत्तर महाद्वाराच्या बाहेर लगोलग सर्वेश्वर तीर्थ आहे. मंदिराच्या परिसरात काही सत्पुरूषांच्या समाध्या आहेत. पश्चिम दरवाजाला लागूनही अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत.4

5

6

गाभारा.
7

    शहरापासून ५ कि. मी. अंतरावर बालाघाटातील एका डोंगरात मराठीतील आद्यकवी मकुंदराजांची समाधी आहे. हा संपूर्ण परिसर शांत व सुंदर आहे. जवळच जयवंती नदी डोंगराच्या कड्यावरून खाली दरीत कोसळते. या दरीस अश्वदरी असे म्हणतात.
      संतकवी दासोपंत यांनी अंबेजोगाईस वास्तव्य करून आपली साहित्य रचना केली. त्यांचे निवासस्थान एकमुखी दत्तात्रेयाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष महिन्यात येथे दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.
खोलेश्वर, अमलेश्वर, सकलेश्वर ही मंदिरे जांभुळवेट व अनेक सिद्ध पुरूषांची साधनास्थाने या परिसरात आहेत.हत्तीखाना म्हणून प्रसिद्ध असलेली दगडातील कोरीव लेणी तसेच नुकतेच उत्खनन करून इतिहासाचे साक्षीदार ठरलेले बाराखांबी हे महादेवाचे मंदिर याच अंबाजोगाई परिसरात आहे. बाराखांबी या महादेव मंदिर परिसरात उत्खननादरम्यान अनेक पुरातन मूर्ती आढळल्या आहेत. तसेच अंबाजोगाईतील सदर बाजार परिसरात असलेले बडा हनुमान मंदिर देखील ऐतिहासिक महत्त्व असलेले मंदिर आहे.

8

इथे बऱ्याच पायऱ्या उतरल्यावर (मोजल्या नाहीत पण दीड -दोनशे तरी असाव्यात) खाली दारीतल्या समाधीस्थळी आपण पोचतो.

9

10

11

मुकुंदराज स्वामींची समाधी.
12

13

 माहिती देणाऱ्या बोर्डाचे 2 फोटो खाली देत आहे ते झूम करून माहिती वाचता येईल.मुकुंदराज स्वामी समाधी पाटीवरची माहिती

 14

श्री मुकुंदराज व जयत्पाल यांचे चरित्र

शके नऊशे पन्नास (९५०) चे सुमारास आंबापुर नामे ग्रामा मध्ये महापराक्रमी जयत्पाल या नावाचा राजा होऊन गेला. त्याला ब्रम्हह्यस्वरुप पाहण्याची अति उत्कंठा झाली. असहा कारणाने तो जो साधु आंबापुर नगरात येईल त्याचे समोपचाराने यथा विधी जयत्पाल राजाने षोडशोपचार युक्त पुजन करुन अति नम्रतेने त्या साधुची विनंती करावी की महाराज कृपा करुन ब्रम्हह्मस्वरूप दर्शन मला द्या. ही राजाची विनंती सफल झाली नाही तर राजा क्रोधमान होऊन त्या साधुस कारागृह वासात पाठवून द्यावे व दिवसात गांवाच्या उत्तर दिशेस तळे खोदण्याचा काम करुन घ्यावा व उत्तर रात्रीस प्रत्यक साधुने घोड्याचा दाणा भरडावा असा क्रम सतत चालु असता साधुजन त्या ग्राम सनींध येण्वास धजेनासे झाले । ही वार्ता जाता जाता श्री क्षेत्र काशी पर्यंत गेली.

त्याकाळी श्री मुकुंदराज काशी क्षेत्रात अनुष्ठान योग अभ्यास करीत असता त्यांस जयत्पाल राजाचे वर्तन ऐकून फारच वाईट वाटले व आपल्या गुरुपाशी जाऊन विनंती केली की गुरुराज दक्षिण प्रांती जयत्पाल राजा साधु संतास फार त्रास देत आहे. करिता ह्या आपल्या दासास तेथे जाऊन सर्व संतास बंदी वासातून मुक्त करीन. ही वार्ता ऐकताच गुरुंनी त्यांस जाण्याची परवानगी व आशीर्वाद दिला. ज्या काळी मुकुंदराज काशी क्षेत्रात होते तेव्हा त्यांनी पुष्कळ ग्रंथ लिहीले. त्यापैकी श्री विवेकसिंधु, परमामृत, पवनविजय अशी छापून तीन पुस्तके पसिद्ध झाली आहे ती पाहण्यासारखी आहेत. नंतर महाराज काशीपुरीहुन महाराज गुरु आज्ञा घेऊन निघाले ते आंबापूर ग्रामा सनीद्य येताच हजारों साधु तळी खोदण्यात गुंतले आहे व राजरक्षक त्यांचे कडून काम करुन घेत आहे हे पाहताच महाराजांनी बालरूप घेऊन नारायण नावांचा गजर करीत प्रवेश करु लागले. त्या दिव्य मुर्ती कडे पाहुन वेशीवर असलेल्या राज रक्षकांनी अनेक प्रकारांनी मुकुंदराजास विनंती केली की महाराज आपल्यासारख्या कोमल बाल तनुला आमचा राजा कारागृह वासात पाठविल, याज करीता आपण नगरात जाऊ नये. मुकुंदराजांनी आपला जाण्याचा आग्रहच दाखविला आणि निघाले ते थेट राजवाड्यात शिरले. इतक्यात जयत्पालाची आणि मुकुंदराजाची गाठ पडताच महाराज मजला कृपा करुन ब्रम्हा दाखवा अशी राजाने विनंती केली तेव्हा मुकुंदराजांनी राजास सांगीतले की तु घोड्यावर सर्व सरंजाम घालून तयार करुन त्यावर स्वार होऊन ये म्हणजे बम्हह्य दाखवितो. त्यांचे आज्ञे प्रमाणे राजाने सेवकांकडून घोडा. सर्व सरंजामानिशी तयार करुन हजर केला. घोडा तयार होऊन येताच

(

मुकुंदराजांच्या चरित्रात उल्लेख आलेला जयत्पाल उर्फ जैत्रपाळ हा यादव घराण्याची संबंधित नसून कलचुरी घराण्याचा मांडलिक राजा होता व त्याची राजधानी आंबे ही होती. हा जैत्रपाळ जैन होता. येथील लेणींतील असलेल्या कमरेवर हात ठेवलेल्या कलचुरी शैलीतील द्वारपालांवरुनही येथे कलचुरी आणि राष्ट्रकूटांचा प्रभाव होता असेच दिसते.

स्वतः मुकुंदराजही आपल्या आरतीत म्हणतात

जैतपाळ भूपतीने केला दर्शना कोंड|
अपरोक्ष बोध वाहे त्यासि घातलें कोड ||

आंबेजोगाई येतील काही शिलालेखांवरुन ह्याचे पूर्वीचे नाम आम्रपूर होते असे दिसते व हे ग्रामनाम योगेश्वरी उर्फ अंबा देवीवरुन पडले नसून फलवाचक (आम्र) आहे असे स्पष्टच दिसते. लीळाचरित्रातही अंबेजोगाईचा उल्लेख 'खोलनाएकाचेया आंबेया' (खोल नायकाचे आंबे) असा येतो. हा खोल नायक म्हणजे सिंघणाचा पराक्रमी सेनापती खोलेश्वर होय. अर्थात आंब्याची योगेश्वरी-योगाईचे आंबे-जोगाईचे आंबे- अंबेजोगाई असे नामकरण नंतर झालेले दिसते.)

15

त्यांस मुकुंदराजांनी जयत्पाल राजास सांगीतले की राजा घोड्यावर स्वार हो एका रिकाबीत पाय ठेव व दुसऱ्या रिकाबीत पाय टाकण्यापुर्वी तुला आता ब्रम्हह्यस्वरूप दर्शन करुन देतो. रिकाबींवर पाय ठेव हे मुकुंदराजांचे तोंडचे शब्द ऐकताच राजाने दुसऱ्या रिकाबीत पाय ठेवला व घोड्यावर स्वार होताच मुकुंदराजाने जो एक चाबुकाचा सपाटा राजासह घोड्याला मारला त्या बरोबर राजासह घोडा जो ठाणावर उभा राहीला तो सारखा सात दिवस चौकात उभा होता. घोड्याची किंवा राजाची हालचाल काहीच होत नाही आशा प्रकारे राजाची घोड्यावर सात दिवस सारखी समाधी लागल्यावर आठवे दिवशी समाधी उतरवून मुकुंदराजानी जयत्पालास विचारले की राजा बम्हह्यस्वरुप दर्शन झाले का तेव्हा घोड्यावरुन खाली उतरुन जयत्पाल राजाने मुकुंदराजास साष्टांग नमस्कार घातला आणि मोठ्या नम्रतेने व आदर पुर्वक म्हणाला की महाराज आपल्या कृपेने सर्व हेतु परिपुर्ण झाले आता या दासास जी आज्ञा कराल ती सीरसामान्य आहे. नंतर मुकुंदराजाच्या आज्ञेने जयपाल राजाने सर्व साधुसंतास कारागृह वासातून सोडवून आणिले आणि त्या सर्वांचा मोठा गौरव करुन कृत ते थेट अपराधाची क्षमा मागितली व या सर्वांच्या इच्छित ठिकाणी जाण्याची परवानगी दिली. त्या साधु संतानी मुकुंदराजाचा आभार मानून आप आपल्या इच्छित ठिकाणी तेव्हा गमन करिता नगराचे बाहेर निघाले परंतु जयत्पाल राजा त्याचे मागोमाग घोड्यावर स्वार होऊन पुन्हा दर्शनाची ईच्छा करुन जाऊ लागला. महाराजांनी मागे राजा घोड्यावर येत आहे असे पाहताच धुम ठोकली महाराज पुढे व राजा मागे असे जात असता पुढे जयवंती नदीचा मोठा तटलेला कडा पाहताच महाराजांनी पैरतीरी उडी करीत अनेक के बाल जाऊ डताच करुन कडून

ठोकली व अंतरध्यान पावले मागुन राजांनी त्यांचे मागोमाग घोडा घातला. घोड्यासह डोहात बुडाला त्या ठिकाणाला अद्यापी लोक घोडदंडा असे नावाने संबोधितात व महाराज ज्या ठिकाणी अंतरध्यान पावले त्याच ठिकाणी त्यांचे भक्तांनी त्यांची समाधी बांधली आहे. ते ठिकाण फार रमनीय आहे. डोंगर कोरुन देवळाकृती सभामंडप केला आहे. त्या ठिकाणी जाण्यास वरुन खाली समाधी पर्यंत पक्क्या पायऱ्या बांधल्या आहेत व समाधीच्या नजीकच एक गोड पाण्याचे झरे आहेत व खाली आणखीन डोंगराच्या कडीने उतरत गेल्यास जयवंती नदी आहे व त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर जयत्पाल राजाचे घोडदडा नावाचे फार खोल व भयकारक डोह आहे. पावसाळ्यात हे ठिकाण फारच रमणीय दिसतो त्याचे पलीकडे बुटेनाथ डोंगराचे कपारीत देवस्थान आहे. त्याचे वरच्या सर्व डोंगरात वनस्पती जडीबुटी आपोआप उगवतात. आश्विन मासी दुरदुरचे लोक येवुन जडीबुटी, बल्ली घेऊन जातात ती फार गुणकारी असते अशी प्रसिद्धी आहे. म्हणून. . . .

सोमेश्वर मंदीर

आणि नागनाथाचे मंदिर, सीतेची नहानी, नागझरी कुंड ही ठिकाणे देखील प्रेक्षणीय आहेत. निजामकालीन काही अवशेष या शहरात अस्तित्वात आहेत. खोलेश्वर मंदिर परिसरात निजामकालीन बुरूज आहे.

      मराठवाड्यातील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे अंबेजोगाई हे शहर परळी वैजनाथपासून अवघ्या ३५ कि. मी. अंतरावर आहे.
योगेश्वरी देवीची स्थापना व मंदिराचा इतिहास :-
    योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा काळ भारतात आदिशक्तीची उपासना सुरु झाली. तेव्हापासूनचा धरण्यास हरकत नाही. आता आदि शक्तीची उपासना केव्हापासून सुरु झाली ते पहावयाचे असेल तर आपणास ऋग्वेद कालाइतके मागे जावे लागेल. तरीपण इतिहास संशोधकांचा तर्क कठोर विचारसरणीप्रामाणे असे अनुमान करण्यात येते की, शैव वैष्णव शक्ती इत्यादी धर्मपंथातील उपाय देवतांचा समन्वय घडवून आणणारी पंचायतन पूजा राजघराण्याच्या उत्तर काळात सुरु झाली असावी. हे अनुमान मान्य केले तर सुमारे दीड हजार वर्षापूर्वी मुर्तिस्थापनेच्या काळापासूनच योगेश्वरी देवीची स्थापना झाली असावी. असे समजण्यास हरकत नाही.
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. अंबाजोगाई हे क्षेत्र फार प्राचीन आहे. यादव राजवटीत हे एक समृद्ध शहर होते. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, नंतर निजाम अशा विविध राजयकर्त्यांनी या भूमीवर राज्य केले आहे. देवीचे मंदिर यादवकाळात बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धारही झालेला दिसतो. एका यादवकालीन शिलालेखानुसार या मंदिराला तीन कळस होते.
येथे सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पूर्वी निजामकालीन घोड्यांचा खूप मोठा तबेला होता. निजामच्या राज्यात या गावाचे नाव बदलून मोमिनाबाद असे ठेवले गेले होते.
मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला असे म्हणले जाते, याबाबत सर्व भाषातज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधु या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे (जे रझाकारांविरुद्ध लढले) या प्रसिद्ध व्यक्तींचा या शहराशी संबंध आला आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याची सुरुवात देखील अंबाजोगाई येथे मराठी शाळा स्थापना करून केलेली आहे. मराठीचे आद्य कवी, 'विवेकसिंधु'कर्ते मुकुंदराज आणि दासोपंतांचा अधिवास लाभलेले हे स्थान आहे.
         येथील चौबारा गणेश मंदिर, भोगादित्य मंदिर, सकळेश्वर व खोलेश्वर मठ, शिवलेण्यांतील गणेश, सप्तमातृका, तांडवयुक्त शिव, पार्वती, त्रिमूर्ती, अंबाजोगाई देऊळ, रागनारायण देवळाचा उल्लेख धर्म व उपासना करणार्‍यांची माहिती देत असले, तरी अंबाजोगाई देवीच्या स्थानाचा स्पष्ट उल्लेख शके 1066 च्या लेखात येतो. तो असा- ॐ स्वस्ति संवतु, 1066 रक्ताक्षी संवत्सरांतर्ग्नत अश्विन शुद्ध 1 गुरुदिने अहा इह श्रीभूचरनाथ पाद पंकज भ्रमर श्री रत्नदेव: गुरु: चरण आराध. तप्तर अंबा समाधिष्ठित महामंडलेश्वर उदयादित्य देवेन परम भक्त्या... अंबाजोगाईचा हा शके 1066 इ. स. 1144 चा शिलालेख अंबा समाधिष्ठित निर्देशाने भगवती स्थानाचा स्पष्ट उल्लेख करणारा असून त्याचा अर्थ अंबादेवी स्थानाशी संबंधित असलेला तेथील राजा असा आहे. या राजाचे नाव उदयादित्य असे असून तो गंग वंशातील होता. त्याच्या गुरूचे नाव श्रीरत्नदेव असे होते. शिवाय तो भूचरनाथाच्या परंपरेतील होता. मात्र, उपरोक्त संस्कृत वाक्याचा वेडावाकडा अर्थ जो लावण्यात आला, तो अग्राह्य तर आहेच; पण, त्याच बरोबर स्थानासंबंधित धार्मिक व सांस्कृतिक परंपरा दुर्लक्षित करणारा आहे.
     अंबाजोगाई हे देवीस्थान आहे. या स्थानाशी देवीभक्त व देवी उपासक मोठ्या प्रमाणावर संबंधित असतात. भूचरनाथ हे या लेखातील नाव देवी उपासकांच्या परंपरादर्शक आहे. ‘नाथ’ पदान्त देवी उपासकांच्या ज्या ज्या परंपरा आहेत, त्यापैकी भूचरनाथ एक आहे. असेच दुसरे नाव ललितानंदनाथ आढळते. जबलपूर ग्वारी घाटावर श्रीपाद आश्रम ज्यांचा आहे, त्या स्वामी महाराजांचे नाव विकासानंदनाथ आहे. माझे नाव विकासानंद नसून विकासानंदनाथ आहे, असे त्यांनी मला सांगितले. तेव्हा ‘नाथ’ पदान्त भूचरनाथ अशा पठडीतील आहे. भूचरनाथ-रत्नदेव हे अंबादेवी परंपरेतील गुरुशिष्य शके 1066 मध्ये अंबाजोगाईला होऊन गेले. तसेच ‘योगेश्वरी माहात्म्य’ नावाच्या स्थल पुराणातही बुटीनाथादि सिद्धांच्या ज्या कथा आहेत, त्या पाहता ‘नाथ’ पदान्त अंबादेवी उपासकांचे व तपस्वी सत्पुरुषाचे हे स्थान होते, हे स्पष्ट होते.
      आजपर्यंतच्या अभ्यासक, संशोधकांनी प्रामुख्याने राजवंशपर हकिकतींना प्राधान्य देऊन राजकीय इतिहास सादर करताना धार्मिक-सांस्कृतिक परंपरांना एक तर दुय्यम व गौण स्थान देण्याचे जे धोरण स्वीकारले, त्याचा उत्तम नमुना अंबाजोगाई येथील शिलालेखाचा अभ्यास व निष्कर्षाने आढळतो. राजवंश व त्यांचा वारसा चालविणारे आजचे राजकीय पक्ष यांच्याऐवजी परंपरा भारतीय व्यक्तींनी व कुटुंबांनी अधिक जोरकस पण, चिकाटीने व सातत्याने जे कार्य केले, ते पाहण्यासारखे आहे. माहूर, अंबाजोगाई, कोल्हापूर, तुळजापूर, जेजुरी या स्थानावर आजही पिढ्यानुपिढ्या सातत्याने, अखंड अनेक व्यक्ती किंवा कुटुंब कुलदेवता किंवा कुलदेव म्हणून यात्रारूपाने जात आहेत. देव व कुल असे हे नाते आहे व ते सातत्याने चालू आहे. देवदेवता-कुलदेवता सातत्य या क्रमाने हिंदू कुटुंबाचे जे धागेदोरे आपल्या धर्म व सांस्कृतिक जीवनाने पिढ्यानुपिढ्या उराशी बाळगून पुढील पिढीने तो वारसा स्वीकारणे व जोपासणे असे हे जे धर्मचक्र आहे, या धर्मचक्राचा प्रधानबिंदू धर्मतीर्थक्षेत्र आहे. अंबाजोगाई हे असेच विख्यात धर्मचक्रस्थान आहे.
  अंबाजोगाई नावाने हे स्थान आज प्रसिद्ध असले तरी स्थलमाहात्म्यकार मात्र जो उल्लेख करतात तो महत्त्वाचा आहे. स्थलमाहात्म्यकार ‘योगेश्वरी माहात्म्य’ शीर्षकाने आपल्या ग्रंथाचा उल्लेख करतात तसेच प्रचलित नावदेखील ‘अंबाजोगाई’ असे आहे. जोगाई म्हणजे योगिनी. योगिनी असा नामनिर्देश केल्यानंतर ‘अंबा’ नावाने का निर्देश केला जातो, हे कळत नाही. जबलपूर भेडाघाट येथे यवनांनी विध्वंस केलेले स्थान आहे व या स्थानाचा आजही उल्लेख ‘चौसट योगिनीका मंदिर’ (64 योगिनी मंदिर) असाच केला जातो. मी हे मंदिर पाहिले आहे व यवनांनी मूर्तीचा कसा विध्वंस केला, हे आज कोणीही तेथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहू शकतो. तथापि, 64 योगिनी स्थान किंवा मंदिर असाच उल्लेख येतो. योगिनी या देवीच्या सख्या आहेत. त्यांची संख्या 64 आहे. परंतु, त्या भगवतीच्या सख्या असल्याने काही वेळा 8 सख्या किंवा 16 सख्या अशा गटाने येतात. 8/16/64 या संख्यादेखील उपासनेत आढळून येतात व त्यांना विशेष संज्ञाही आहेत. 8/8 कोणाचे किंवा 16/16 कोणाचा मंदिराचा गाभारा जो आढळतो तो योगिनीशी संबंधित असतो. 8/8 योगिनीच्या फेर्‍यात किंवा 16/16 च्या फेर्‍यात मध्यस्थानी देवी असते. देवीचे मंदिर हे उभारलेले किंवा दगडविटांनी बांधलेले नसून आपल्या योगिनी सख्यांच्या मेळाव्यात विशिष्ट आकृतिबंधात ती विराजमान असते. योगिनी या ज्योतिरूप असतात व त्यांचा प्रकाश चंद्रप्रकाशासारखा आल्हाद व प्रसन्नकारण असतो. म्हणूनच अष्टमी तिथीला देवीपूजनाला अतिशय महत्त्व आहे.
     शिव व देवी स्थानांचे काही पारंपरिक संकेत आहेत. शिव क्षेत्राप्रमाणे देवी क्षेत्राला भैरव असतो. इतर कोणत्याही क्षेत्राला भैरव नसतो. भैरव हा क्षेत्ररक्षक आहे. भैरवामुळे मूळ देवतास्थानाचा मार्ग मोकळा होतो. शैव परंपरेत व देवी परंपरेत भैरवाला अनन्यसाधारण महत्त्व असते. नवनाथ भक्तिसार ग्रंथ नाथभैरवांचे आलेले प्रसंग हे शैव व देवी उपासनेतील आहेत. काल्पनिक कथा नाहीत. तंत्रविद्येत भैरवाची विपुल माहिती मिळते. माहूरला रेणुका देवीचा भैरव झंपटनाथ आहे. शिवाप्रमाणेच देवीच्या भैरवांची संख्या आहे. विशेष लक्षणीय म्हणजे भैरव हा केवळ क्षेत्ररक्षक आहे, असे नव्हे तर तो कार्यप्रवीण आहे.
      भैरवाप्रमाणे योगिनी आहेत. मात्र, योगिनी शक्तीशी संबंधित आहेत. शिव उपासनेत योगिनी नसतात. शक्ती उपासनेत विशेषत: तंत्रसाधनेत योगिनी असतातच असतात. श्रीरामकृष्ण परमहंस देवांना भेटलेली भैरवी ही योगिनीच होती व तिने सर्वप्रकारच्या तंत्रसाधनेत मार्गदर्शनही केले. केवळ योगिनींना प्रमाण ज्ञानवंत म्हणून देवी-भगवती साधना करणारा एक संप्रदाय आसाममधील कामाख्यापीठात होता, असे दिसते. त्याला ‘योगिनी कौल’ नावाने संबोधित असत. ‘कामरूपे इदम् शास्त्रम्। योगिनीनाम् गृहे।’ अशी त्याची ख्याती होती. नवनाथांतील मत्स्येंद्रनाथ या योगिनी कौलाची साधना करण्यासाठी कामरूप (आसाम) प्रदेशात गेले होते. हा संप्रदाय योगिनी प्रवर्तित असल्याने ‘स्त्री राज्य’ नावाने समजण्यात आला. अर्थात स्त्री योगिनी देवी. मराठी संत वाङ्मयातील ज्ञानदेव भगिनी ही योगिनीच होती. योग व तंत्रशास्त्रात ती निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांप्रमाणेच निपुण होती. चांगदेवाची-योगसंपन्न चांगदेवाची ती गुरू होती व त्याला शैवतंत्रप्रधान नाथपरंपरेची साधना मुक्ताईने दिली.
     योगिनी ही दूती असते. उच्च प्रकारच्या साधकाला देवीचे संदेश पोहोचविण्याचे कार्य दूती करते. तंत्रालोक या विख्यात अभिनवगुप्तांनी तंत्र उपासना-साधनेत केवळ दूतीचे उल्लेखच नव्हे तर दूतीविषयक सविस्तर विवेचन केले आहे. देवीची, आद्यादेवीची ही योगिनी योग, तंत्रसाधना करणार्‍या साधुसंतांच्या रचनेत आढळते. श्री ज्ञानदेव व त्यांच्या परंपरेतील नाथसिद्धांच्या रचना पाहण्यासारख्या आहेत. स्वत: ज्ञानदेव महाराज म्हणतात,
 
1) रूप पाहता लोचनी। सुख जाले वो साजणी।
तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।
बहुतां सुकृताचि जोडी। म्हणुनि विठ्ठली आवडी।
सर्व सुखाचे आगरू। बाप रखमादेवी वरू।
2) चित्त वित्त हरि जाला वो साजणी
अवचिता अंगणी म्यां देखियेला
3) ऐसा हा सांवळा सतेज साजणी
म्यां आपुल्या अंगणी देखियेला
 
साजणी अर्थात दूतीरूपात योगिनी भेटतात, दर्शन देतात, प्रेरणा देतात. योगिनी, भगवतीच्या नित्य सहवासात असलेल्या योगिनी ज्योतिरूपात असतात. भगवतीच्या आठही दिशांना एकेक योगिनी विराजमान असते. अशा आठ आहेत. प्रथमा ते पौर्णिमेसह 15 व अधिक एक अशा 16 योगिनी अमृतकलेसह शोभायमान असतात. पण योगिनी 64 योगिनीची दिव्यरूपता त्यांच्या ज्योतिमयतेतून सुगंधासह पाझरत असते व ही रूपता भगवतीच्या केशकलापावर अशातर्‍हेने आकृतिमान असतात. हळूहळू त्याची रूपबंधता शिखररूपात झळाळत असते. हिंदू मंदिराला शिखर असते व शिखरासह हिंदू देवदेवतांचे मंदिर पाहिले की शिखराला वंदन करण्यास आपण हात जोडतो. शिखराची निर्मिती भगवतीच्या मस्तकावरील सुगंधित परिमळासह ज्योतिरूपात असलेल्या योगिनीतून झालेली आहे. सुगंध व ज्योत असे हे दृश्य आहे. याचीच खूण म्हणजे हिंदू परंपरेतील स्त्री आपल्या मस्तकावरील केशकलापाला पुष्पाने शोभा देते. आपल्या केशकलापाला गजरा व पुष्पांनी शोभायमान करण्याची हिंदू स्त्रीची पद्धत आहे व विश्वातील समस्त स्त्री वर्गात पुष्पांनी शोभा आणणारी हिंदू परंपरेत आढळते. मस्तकावर केशकलापाचे सौंदर्य भगवतीच्या शिखररूप सुगंधित ज्योतिमय योगिनीचे आहे. अशा योगिनींच्या आकृतिबंध (श्री यंत्रमय) समूहात भगवती, योगेश्वरी, जगदंबा विराजमान आहे. ती षोडशी त्रिपुरा आहे. रत्नांनी लखलखणारी, तेजाने तळपणारी, प्रकाशाने प्रज्वलित ज्योतिरूप योगिनींच्यासह पुष्पांनी सुशोभित, अंगप्रत्यंगातून सुगंध परिमळाची ही अमृता, ही शिवानी, ही श्रीपाद श्री वल्लभेश्वरी, ही शिवा, ही शिवाची पार्वती देवदेवेश्वरी समस्त योग्यांची योगेश्वरी आपल्या 64 योगिनींसह अंबादेवी, अंबाजोगाई दर्शनास आलेल्या वधूवरांसह समस्त भक्तांना सुख देणार्‍या अंबाजोगाईला गेलो असताना एकच एक नादध्वनी गुणगुणताना पाहून आपणही आपोआप म्हणू लागतो, प्रसिद देवी, प्रसिद देवी, भगवते... 

योगेश्वरी नाव कसे पडले ?

योगिनी हृद्यदिपिकेत योगिनीचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे. पार्वतीच्या शक्ती अंशाने उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या आणि ब्रम्हा, विष्णु, महेश आणि देवता यांच्या मध्ये अंतर्भुत असलेल्या लहान मोठ्या पंचभौतिक परमाणुयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असे संबोधतात. योगीनीमध्ये प्रमुख किंवा योगिनीच्यावर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय. या प्रमाणे योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्रचारात आले असावे.

देवीच्या अख्यायिका :-

देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप. ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. दांतसूर नावच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता. त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचे पारिपत्य केले. दांतसूरचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली, म्हणून या जागेस जोगाईचे आंबे आणि पुढे आंबेजोगाई, असे नाव प्रचलित झाले. दांतसूरचा वध केला म्हणून ही देवी दांतसूरमर्दिनी झाली.
अमूर्त अनघड अशा तांदळ्याच्या रूपातली ही योगेश्वरी कुमारिका आहे. त्यामागे एक कथा सांगितली जाते, परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. कोकणातून देवी आणि वऱ्हाडी मंडळी परळीला निघाले. लग्नाचा मुहूर्त ठरला; पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता, देवी ज्या ठिकाणी राहिली, ते आजचे आंबाजोगाई. ११व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी, हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले.
देशावरची ही देवी कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे. हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडित आहे. परशुरामांनी अपरांत, म्हणजे कोकण भूमीची निर्मिती केल्यावर, त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली. तिथे समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या १४ व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली. या १४ व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबाजोगाईतून वधू नेल्या. वधू नेताना योगेश्वरीने एक अट घातली, ज्यांच्याशी या मुलींचा विवाह होईल, त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल.

योगेश्वरी देवीची दैनंदीन पूजा, आरती व मंदिरात साजरे केले जाणारे सण :

योगेश्वरी दर्शनाला आल्यानंतर भक्त आपला अभिषेक, भोगी (साडी ओटी) करून सभामंडपात आरती करतात. तसेच देवीची आरती हि ठीक दुपारी १२: ०० च्या दरम्यान होते. त्यादरम्यान अतिशय उत्सहाने भक्त आरतीला उपस्तीत असतात व देवीचा नगाराही त्यावेळेला ऐकवायला मिळतो. आरती झाल्यानंतर आरती होमकुंडा कड़े जाते व नंतर लगेच आरती सर्वाना मिळते. आरतीवेळेला अंदाजे १० ते १५ मिनिट दर्शनाला गाभार्यात जाता येत नाही. पण आरती झाली की लगेच देवीचे दर्शन गाभार्याच्या आत जाऊन घेता येते. देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो.
देवीच्या भक्तीचे व्रत घेणारांना ( आराधी होणारांना ) परडी आणि पोत यांचा व्रतांचे प्रमुख चिन्ह म्हणून स्वीकार करावा लागतो. त्यातले त्यात परडी त्यांचा ट्रेंडमार्कच होऊन बसते. योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुधे धारण केली आहेत, त्यात तिने एका हातात पत्र (परडी) धारण केल्याचा उल्लेख रुद्र्यामलखंडातील देवीच्या स्तवनाचे श्लोकात दिला आहे.
इतर शक्तीपिठाच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले हे आयुध (पात्र) दिसून येत नाही. योगेश्वरी देवीचे हे एक वैशिष्ट्य मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहे. योग साधनेत मग्न असलेल्या या देवीने हे चिन्ह धारण करणे योग्यच आहे आणि भक्तांनी सुद्धा आपले आयुष्य अशाच प्रकारे योग साधनेत घालवावे असा त्यांचा उद्देश असावा.
नवरात्रात येथे महोत्सव असतो. मार्गशीर्ष महिन्यातही येथे उत्सव असतो. देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला, म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते.
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला अर्थात देवीच्या जन्मदिनी येथील मंदिरात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. तसेच शारदीय नवरात्रातही येथे यात्रा भरत असते.
नवसाला पावणारी देवी म्हणून योगेश्वरी देवीची ओळख आहे. देवीला पानाचा विडा देण्याची परंपरा आहे. नवरातत्रौत्सवात काकड आरती, अष्टमीला शतचंडी हवन करण्याची प्रथा असून, नवमीला पूर्णाहूती असते. दसर्‍याला योगेश्वरी पालखी असते. ढोल ताश्याच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढली जाते.
नवरात्रौत्सवात देवीला आभुषणांनी चढविले जातात. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी लाखोभाविक गर्दी करत असतात.

विद्येचे माहेरघर अंबाजोगाई :

अंबाजोगाई विद्येचे पुण्यानंतर दुसरे माहेरघर समजले जाते. येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३२ साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आजही या संस्थेचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दबदबा आहे. या संस्थेच्या विविध शाळा कॉलेजांमधून इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहे.
दुसरी शिक्षण संस्था म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था. या संस्थेची स्थापना सन १९५१ मध्ये श्री. वैद्य काका, खारकर गुरुजी, धायगुडे गुरुजी आणि कोदरकर गुरुजी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केली. आज मराठवाड्यात जवळपास ३५ ठिकाणी या संस्थेचे कामकाज चालते आहे. ही मराठवाड्यातील क्रमांक दोनची संस्था आहे. विविध कोर्सेस या संस्थेत चालवले जातात.
ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाई हे ज्ञान प्रबोधिनीचे विस्तार केंद्र अंबाजोगाईत कार्यरत आहे. प्रसाद चिक्षे हे सध्याचे केंद्र प्रमुख म्हणून त्याचे काम पाहतात.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रहाण्याची सोय :

विश्वस्त मंडळाने भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्राच्या सर्वच भागातून येणाऱ्या देशभक्तांच्या निवासासाठी १७ खोल्यांचे सुसज्ज व सर्व सोयींनीयुक्त असे यात्री निवास बांधले आहे. मंदिराच्या उत्तरेस तीर्थासमोर भव्य असे मंगल कार्यालय बांधलेले आहे. ज्यामध्ये लग्न, मौंजी आणि सभा, संमेलने होतात. यात्री निवासमध्ये भाविकांच्या निवासाची उत्तम सोय आहे.

दळणवळण :

अंबाजोगाईला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बस स्थानक असून, महाराष्ट्र तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील शहरांशी हे शहर जोडले गेले आहे. जवळील रेल्वे स्थानक परळी २५ किमी व अहमदपूर २० किमी येथे आहे. तर जवळील विमानतळ लातूर येथे आहे. अंबाजोगाईहून पुणे ३०५ किमी, मुंबई ४४८ किमी, हैदराबाद ३२४ किमीवर आहेत.

**************॥श्री योगेश्वरी अष्टक॥************

अंबे महात्रिपुर सुंदरि आदिमाये ।
दारिद्र्य दु:ख भय हारुनि दाविपाये ।
तूझा अगाध महिमा वदती पुराणी ।
योगेश्वरी भगवती वरदे भवानी ॥१॥
आता क्षमा करिशि तू अपराध माझा ।
मी मूढ केवळ असे परि दास तूझा ।
तू सांडशील मजला जरि हो निदानी ।
योगेश्वरी भगवती वरदे भवानी ॥२॥
लज्जा समस्त तुजला निज बाळकाची ।
तू माउली अतिशये कनवाळु साची ।
व्हावे प्रसन्न मजला परिसोनी कानी ।
योगेश्वरी भगवती वरदे भवानी ॥३॥
नेणो पदार्थ तुजवाचुनि अन्य काही ।
तू मायबाप अवघे गणगोत आई ।
तूझाच आश्रय असे जगि सत्य मानी ।
योगेश्वरी भगवती वरदे भवानी ॥४॥
निष्ठूरता जरी मनी धरशील आई ।
रक्षील कोण मजला न उपाय काही ।
आणीक देव दुसरा ह्रदयात नाही ।
योगेश्वरी भगवती वरदे भवानी ॥५॥
हे चालले वय वृथा पडलो प्रपंची ।
तेणे करून स्थिरता न घडे मनाची ।
दु : खार्णवात पडलो धरि शीघ्र पाणी ।
योगेश्वरी भगवती वरदे भवानी ॥६॥
जाळीतसे मजसि हा भवताप अंगी ।
याचे निवारण करी मज भेट वेगी ।
आनन्द सिँधु लहरी गुण कोण वर्णी ।
योगेश्वरी भगवती वरदे भवानी ॥७॥
तू धन्य या त्रिभुवनात समर्थ कैसी ।
धाके तुझ्या पळसुटे रिपु दानवांसी ।
येती पुजेसी सुर बैसुनिया विमानी ।
योगेश्वरी भगवती वरदे भवानी ॥८॥
जैसे कळेल तुजला मज पाळी तैसे ।
मी प्रार्थितो सकळ साक्ष निदान ऐसे ।
गोसावीनंदन म्हणे मज लावि ध्यानी ।
योगेश्वरी भगवती वरदे भवानी ॥९॥

|| जय माता दी |

मुकूंदराज स्वामींची समाधी :-
  


  मुकुंदराज (जीवनकाल: इ.स.चे १२वे शतक) हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस ५ कि.मी अंतरावर आहे.समाधी असलेली टेकडी मुकुंदराज टेकडी म्हणून ओळखली जाते. बाजूने, विवेकसिंधूमध्ये उल्लेखित बाणगंगा नदी वाहते.
       वेदांत तत्वज्ञान आत्मसात करणारे पहिले कवी होण्याचा मान महाराष्ट्राच्या सर्वात प्रख्यात आणि प्राचीन कवींपैकी एक असलेल्या मुकुंदराजांना आहे, त्यांनी साध्या मराठीत श्लोकांची रचना केली. जैत्रपाळ या जैनानुयायी राजाने सिध्दी मिळविण्यासाठी साधु बैराग्यांचा छळ केला.पण मोक्षप्राप्ती महत्वाची सिध्दी व्यर्थ अस मुकुंदराजांनी जैत्रपाळाला पटवून दिले आणि विवेकसिंधु या वेंदाताचे सार असलेल्या ग्रंथ जन्माला आला.
  मुकुंदराज स्वामी पूर्वी ज्या परिसरात निवास करत होते तो भाग दाट जंगलानी अच्छादलेल्या टेकड्यांच्या आहे. पावसाळ्यात जेव्हा डोंगरावरुन धबधब्याचे प्रवाह येतात तेव्हा हे दृश्य मनाला मोहून टाकते. 
   गुहेच्याच्या आत असलेली समाधीला जवळजवळ १०० पायर्‍या उतरून जाता येते. समाधी निवासस्थानाची इमारत नंतर  बांधली गेली. खाली असलेल्या मैदानामध्ये त्यांचे भक्तांनी एक विशाल मंडप उभारला आहे. या मंडपात विठ्ठल रखुमाईचे एक छोटेसे मंदिरही बसविण्यात आले आहे.
  दर महिन्याला कीर्तन आणि भजनाची व्यवस्था केली असता, प्रत्येक महिन्यात  एकादशीच्या मोठा कार्यक्रम असतो. मार्गशीर्षात मुकुंदराजांच्या स्मरणार्थ उत्सव साजरा केला जातो.
 नागझरी तीर्थ
    शहराच्या पूर्वेस सुमारे १.६० किमी (एक मैल) वर, नागझरी तीर्थ आहे ज्याचा उल्लेख योगेश्वरी महात्म्यात सापडतो. बालाघाट परिसराच्या एका डोंगरावर हे वसलेले आहे. कातळात कोरलेल्या गोमुखापासून पाण्याचा पातळ प्रवाह कुंडात शिरताना दिसतो. नागझरी तीर्थाचा झराकधीही कोरडे होत नाही. गोमुखातून वाहणार्‍या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत. तीर्थाजवळ महादेवाचे  मंदिर आहे.
 
संतकवी दासोपंत :-
     दासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ दासोपंत (इ.स. १५५१ - इ.स. १६१६) हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. यांचा जन्म शके १४७३मध्ये अधिक भाद्रपद कृष्ण अष्टमी रोजी सोमवारी झाला होता. ते संत एकनाथांचे समकालीन होते. दासोपंत दत्तात्रेयांचे परम भक्त होते.

चित्रस्रोत : साभार दत्तमहाराज. कॉम

सितोपंत देशपांडे यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करून आंबेजोगाईस दासोपंतांची सर्व व्यवस्था लावून दिली. या ठिकाणी दासोपंतांनी अखंडपणे लेखन करून मराठी शारदेस उत्कृष्ट नजराणे समर्पित केले. ‘गीतावर्ण’ नावाचा त्यांचा एक ग्रंथ सव्वा लाख ओव्यांचा आहे. ग्रंथराज, वाक्यवृत्ती, पंचीकरण, पदार्णव, अनुगीता, महापूजा, वज्रपंजरकवच अशी त्यांची लहानमोठ्या प्रमाणावरची रचना विपुल आहे. दत्तात्रेयांचा महिमा तर त्यांनी अनेक पदांतून गायिला आहे. दासोपंतांच्या दत्तोपासनेची पद्धतही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
   दासोपंतांच्या परंपरेत दत्तात्रेयांचे सोळा अवतार प्रसिद्ध असून सतरावा अवतार म्हणजे स्वत: दासोपंत असून त्यांचा उल्लेख, ‘श्रीसर्वज्ञावत्तार’ म्हणून होतो. उपासनेची त्यांनी ठरवून दिलेली पद्धती अजून चालू आहे. प्रत्येक दिवशीचा उपासनाविधी, सात वारांची वेगवेगळी भजने, पर्वकाळाची आणि उत्सवाची विशेष भजने, पदे, आरत्या, शेजारत्या, अष्टके, स्तोत्रे हे सर्व त्यांनी आखून व रचून ठेविले आहे. विशिष्ट प्रसंगी करावयाची लळिते, संगीत, टिपऱ्या यांचीही रचना केलेली आहे. नित्यासाठी दशनाम, शतनाम, सहस्रनाम, स्तवराज, माहात्म्ये हीही तयार करून दिलेली आहेत… उत्सवपद्धती, सेवा, अर्चन, उत्तरार्चन यांचीदेखील शिस्त त्यांनीच घातलेली आहे… मूर्तीच्या नित्य स्नानासाठीही काही नियम आहेत. ‘आनंदें दत्तात्रेय देवदेव’ हा दासोपंत परंपरेतील जयघोष आहे.
    दासोपंतांनी वरीलप्रमाणे दत्तोपासना दृढ चालावी म्हणून दत्तात्रेयांवर अनेक प्रकारची स्फुट व प्रकरणात्मक रचना केली आहे. अवधूतराज, दत्तात्रेयमाहात्म्य (संस्कृत), अवधूतगीता, दत्तात्रेयसहस्रनामस्तोत्र, दत्तात्रेयदशनामस्तोत्र, दत्तात्रेयषोडशनामस्तोत्र, शतनामस्तोत्र, द्वादशनामस्तोत्र, सिद्ध दत्तात्रेयस्तोत्र, गुरुस्तोत्र, दत्तात्रेयनामावळी, षोडशअवतारस्तोत्र, षोडशअवतार प्रादुर्भावस्तोत्र, षोडश अवतारध्यानस्तोत्र इत्यादी प्रकरणे दासोपंतांच्या परंपरेत नित्य म्हटली जातात. दासोपंतांची पदे अतिशय नादमधुर व भक्तिरसपूर्ण आहेत. द्त्तांविषयी दासोपंतांना वाटणारी करुणा, आशा, भक्ती यांचे मूर्तिमंत दर्शन दासोपंतांच्या पदांतून व्यक्त होते.

चित्रस्रोत : गुगल - दत्त महाराज देवघर आंबेजोगाई.

   दासोपंतांनी स्थापन केलेले एक दत्तमंदिर बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे देशपांडे गल्लीत आहे. तेथे थोरले देवघर धाकटे देवघर असे दोन भाग आहेत. दासोपंतांनी आपले आयुष्य याच मंदिरात व्यतीत केले होते. भगवान दत्तात्रेयांबरोबर त्यांचा सु-संवाद येथेच चालत असे, असे स्थानिक सांगतात. त्यामुळे हे स्थान जागृत असल्याचे अनुयायी सांगतात.
    दासोपंतांची औरंगजेबाबरोबर घडलेली एक हकीकत येथे सांगितली जाते. ती खूप रंजक आहे. औरंगजेबाची दासोपंतांवर खूप श्रद्धा होती. परंतु त्याचा संशयी स्वभाव आणि बादशहीचा गर्व म्हणून त्यांनी दासोपंतांची दत्तभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. दासोपंतांच्या दर्शनाला जातांना एकेदिवशी त्यांनी दत्तात्रेयांचे समोर ठेवण्यासाठी नैवेद्याचे एक ताट बरोबर घेतले. या ताटात बकऱ्यांच्या मांसाचे तुकडे होते. कपड्याने झाकलेले ते ताट बादशहाने दासोपंतासमोर ठेवले आणि देवाला नैवेद्य दाखवण्यास सांगितले. कुठलीही शंका मनीं न घेता समंत्रक प्रोक्षण करून दासोपंतांनी झाकलेल्या त्या ताटाचा नैवेद्य आपल्या आराध्याला दाखवला. नैवेद्य दाखवून होताच औरंगजेबाने ताटावरील आवरण दूर करण्यास सांगितले आणि आश्चर्याचा धक्काच बसला. हे सगळे नैवेद्याचे ताट सुंदर अशा गुलाबाच्या फुलांनी भरून गेलेले होते. त्या फुलांचा सुगंध संपूर्ण मंदिरात दरवळलेला होता. हा चमत्कार पाहताच औरंगजेब नतमस्तक झाला आणि त्यांनी तिथल्या तिथे दासोपंतांच्या दत्त मंदिरास तीन गावे इनाम म्हणून दिली; अशी ही कथा.
    या मंदिरात दत्त जयंती आणि दासोपंतांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हे मंदिर क्षेत्र अतिशय पवित्र व श्रीगुरूंच्या आगमनाने परम-पवित्र झालेले आहे.

दासोपंतांची पासोडी
    दासोपंतांच्या वाङ्मय मंदिराचा कळस म्हणजे त्यांची पंचीकरण ‘पासोडी’ होय. ४० फूट लांब आणि चार फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण, अध्यात्मज्ञानाचा विषय चित्राकृतींतून मांडलेली ही पासोडी मराठी संतवाङ्मयात अनन्य, अपूर्व व एकमेवाद्वितीय अशीच म्हणावी लागेल.
   प्राचीन काळी पांघरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाड्या-भरड्या कापडास पासोडी म्हणत असत. या कापडावर खळीचे लेप देऊन सुकविले जाते. ग्रॅफाईटची पावडर, कवडय़ांच्या साहाय्याने घासून हा कपडा गुळगुळीत केला जातो. या प्रक्रियेतून पासोडी टिकाऊ व मजबूत बनवली जाते. अशा पासोडीवर वेदान्ताचे आकृतीसह स्पष्टीकरण देताना, कपाटाकृती विवरणात्मक मांडणी करताना, कागदाला कागद जोडून लिहिणे गैरसोयीचे व त्याची काळजीपूर्वक हाताळणी करणे व ते दीर्घ काल टिकणे अशक्य व अवघड झाले असते. म्हणूनच पिढ्यान्‌पिढ्या हा अमूल्य विषय अमीट राहावा या उद्देशाने दासोपंतांनी ‘कापड’ हे वैशिष्ट्यपूर्ण माध्यम वापरून चित्राकृतीतून अध्यात्मासारखा विषय प्रतिपादन करणे ही कल्पनाच मुळात अभिनव आहे. यातूनच दासोपंतांतील कलावंताच्या सर्जन व सृजनशक्तीचे दर्शन घडते व अभिजात शिक्षकही मनात ठसतो. विषयांची मांडणी करताना त्या अनुषंगाने त्यांनी अश्वत्थवृक्ष, सर्प, भावचक्र, पंचकोशचक्र, स्थूलादिदेहचक्र, श्रीदत्तमूर्ती, माला, त्रिशूल, शंख, डमरू, कमंडलू, चक्र व हंस या चित्रांचे रेखाटन केले आहे. दासोपंत एक उत्तम चित्रकार होते याची साक्ष पासोडीतील चित्रांवरून सहजच मिळते.
 संपूर्ण पासोडीच्या भोवती सुरेख आणि सुबक अशी वेलबुट्टी काढलेली आहे. चित्रांतील रेषा अत्यंत भावसूचक भासतात. त्यातील वळणे (स्ट्रोक्स) कुशल चित्रकाराचे दर्शन घडवितात. विशेष गोष्ट अशी की, प्रत्येक चित्रात त्यात मावेल असा त्या चित्राचा कार्यकारणभाव व्यक्त करणारा मजकूर योजनाबद्ध रितीने लिहिलेला दिसतो. कुठेही अक्षरांची दाटी नाही किंवा बळेच मजकूर कोंबून बसवलेला नाही. कुठेही खाडाखोड नाही. नियोजनपूर्वक संतुलित असे हे नेटके चित्रमय वाङ्मय विलक्षण म्हणावे लागते. अशा प्रकारे संत वाङ्मयात संत दासोपंत यांचे ग्रंथ आणि त्यांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
मुकुंदराज समाधी मंदिराकडे जाताना डाव्या हाताला नवीन बांधलेली एक सुबक कमान लागते. त्या कमानीखालून जाणारा रस्ता जवळच असलेलया संत दासोपंतच्या समाधी स्थळापर्यंत जातो. हा परिसर वृक्षरोपणामुळे अतिशय रमणीय झाला आहे. एका सध्या काँक्रिट गच्ची केलेल्या दालनास चरेबंदी समाधीचा मोठा चौथरा आहे. दासोपंत समाधी मंदिरासमोर मल्लिकार्जुन, सिद्धीलिंग ही छोटीशी पण प्राचीन मंदिरेही आहेत। अनेक विखुरलेले अवशेष एकत्र करून या मंदिराचे बांधकाम केलेले दिसते. यात काही जैन मंदिराचे अवशेषही दिसतात. एका छोटीशी बांधीव विहीरही येथे दिसते. मंदिराच्या मागील ओट्यावर चढून गेल्यास दोन तीर्थ कुंड दिसतात. यांना नृसिंह तीर्थ म्हणतात. इथेच सुबक असे नृसिंह मंदिर आहे. गाभाऱ्यात जाण्यासाठी अतिशय छोट्या चौकटीतून आत जावे लागते. आत छोटीशी नृसिंह मूर्ती आहे. मंदिरासमोर पिंपळपारावर अभय मुद्रेतील बुद्ध मूर्ती, नागमूर्ती दिसते. एका छोटीशी दीपमाळ सुद्धा आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूस सहा ओवऱ्या बांधलेल्या आहेत. तर डाव्या बाजूच्या तीर्थयाच्या पूर्वेस तीन मोठ्या ओवऱ्या बांधलेल्या आहेत. वेगवेगळ्या वृक्षवेलींनी हा परिसर रमणीय झाला आहे. परिसरात दासोपंतांच्या काही शिष्यांच्या समाध्या आहेत.


येथून मुकुंदराज समाधीकडे जाणाऱ्या रस्तयाच्या उजव्या बाजूला वनखात्याचे वनोद्यान आहे. तेथेच महामृत्युंजय मंदिर आहे. हा परिसर व वनोद्यान हिरवाईने नातेवाले आणि अनेक वृक्षांनी समृद्ध आहे. बालगोपालनसाठी या उद्यानात विविध खेळणी आहेत.

अमलेश्वर मंदिर :-
  अंबाजोगाईतील विविध मंदिरांमध्ये सकलेश्वर आणि आमलेश्वर मंदिरे ही तुलनेने आधीच्या काळातील म्हणजेच पूर्व यादव काळातली (१२ वे शतक) आहेत. आमलेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून एका प्राकारात बांधले आहे. तसेच, मंदिराच्या मागील बाजूस पावसाळी झरा असून त्याच्या बाजूच्या कातळातून दगड काढून मंदिराला वापरलेला असावा. काढलेल्या दगडातून एक बारव तयार केली गेली व शाश्वत पाण्याचा साठा निर्माण झाला. सभामंडप, अंतराल आणि गर्भगृह आणि निरंधार प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूच्या अंतराळ व गर्भगृहाच्या मूळ शुष्कसांधी भिंती शाबूत आहेत, सभामंडपाच्या नवीन बांधल्या आहेत. आज सभामंडपाची मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणी झालेली आहे. मंदिराच्या सभामंडपात तीन प्रवेश आहेत जिथे मूळचे अर्धमंडप असावे. मूळ मंदिराचा पाषाण या जीर्णोद्धारीत मंदिरात बसवलेले आहेत, ज्यावरून अर्धमंडप आणि सभामंडप अर्धखुले असावेत, हे आपल्या ध्यानात येते. मंदिर पीठाचा मोठा भाग आज जमिनीखाली गेला आहे. गजथर, रत्नथरावर छोट्या वामनभिंतीत अर्धस्तंभ व सुरसुंदरी, वादक आणि सिद्ध साधक कोरलेले आहेत. इथल्या गजथरांमध्ये विविध मुद्रेतील हत्तींचे शिल्पांकन आहे, तसेच त्यांच्याबरोबर लढणार्‍या मनुष्याकृती, सिंह व घोड्यांचेही चित्रण आहे. व्याल व किर्तीमुख ही कोरलेली आहेत. या थरावर छोट्या शिखर पंजरांची नक्षी आहे. त्यावरील थरांवर रत्नांची, शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी आहे. या वरचा मंदिराचा मुख्य भाग, मंडोवरावर किर्तीमुख व वेलबुट्टी नक्षी असलेले अर्धस्तंभ आहेत. अंतराळ व गर्भगृहावरील प्रत्येक दोन अर्धस्तंभांमधील खोलगट जागेत देव-देवतांची आणि सुरसुंदरींची शिल्पे अंकित आहेत.


   गर्भगृह हे पंचरथ असून उत्तर, दक्षिण आणि पश्चिम दिशांना ३ देवकोष्टे आहेत, जी आज रिकामी आहेत. आज मंदिराचे मूळ शिखर अस्तित्वात नसल्यामुळे ते कसे असावे, याची कल्पना करणे अवघड आहे. चार मध्यवर्ती अलंकृत स्तंभांनी सभामंडपाचे भाग पाडले आहे व छत हे समतल (वितान) आहे. यातील दोन स्तंभ अप्रतिम शिल्पांनी नटलेली असून, त्यातील स्तंभ मध्यात रामपंचायतन, शिव-पार्वती व दैत्य युद्ध प्रसंग, गणपती, गजांतकशिव व सरस्वती, सप्तमातृका आणि गणपती व हत्तीचे युद्ध असे विस्तृत प्रसंग कोरले आहेत.  नागबंधयुक्त स्तंभांवर रांगेत छोट्या देवता मूर्ती, अंतरालाच्या देवकोष्टात गणपती व उमा माहेश्वराची खंडित मूर्ती आहे. अंतराळाचे नक्षीदार छत समतल असून, नंतरच्या काळात दुरुस्त केले आहे. चार कोपर्‍यात किर्तीमुख असून मधले अष्टकोनी कमळ दगडात कोरले आहे. किन्नर व विद्याधारांबरोबर, नृत्यमग्न शिवाची शिल्पे अंकित आहेत.
   सभामंडपातील पूर्वेकडील आणि उत्तरेकडील छतावरील शिल्पपट्टावर युद्ध प्रसंग कोरलेले आहेत. या प्रसंगांमध्ये कृष्णाने सारथ्य केलेल्या अजुर्नाच्या रथाचे चित्रण आहे. अनेक बाणांचा वर्षाव करणार्‍या वीरांचे अत्यंत प्रभावी शिल्पांकन केलेले दिसते. मुख्य गर्भगृहाची द्वारशाखा खूप साधी आहे, जी नंतरच्या काळात बसवलेली असावी. स्तंभयुक्त द्वारशाखेवरील ललाटबिंबावर कुठलीही प्रतिमा नाही व दोन्ही बाजूला शैव द्वारपाल आहेत. गाभार्‍यातील शिवलिंग मूळचे नसावे. मंदिराच्या बाह्यभागावर अष्टभुज नृत्यगणपतीचे खंडित पण लयबद्ध शिल्प आहे. इतरत्र न आढळणार्‍या आणि उग्र आवेशातील चतुर्भुज नारसिंहीचे वेगळे शिल्प इथे आढळते. मूर्ती खंडित असली तरीही पायाशी असलेले पिशाच्च व हातात खेटक आणि खड्ग स्पष्ट दिसून येते. मर्कट आणि स्त्री, कर्पूरमंजिरी, पुत्रवल्लभा, नूपुरपादिका, शुकसारिका अशा कलात्मक सुरसुंदरी बाह्य भागावर आढळतात.
  मंदिराच्या प्राकार भिंतीत विष्णूच्या त्रिविक्रम अवताराचा वेगळा शिल्पपट्ट आहे. नेहेमीप्रमाणे छत्र घेतलेला वामन बटू न दाखवता छोट्या  विष्णूरूपातून मोठ्या आकाराच्या बळी राजाच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवणार्‍या त्रिविक्रमाचे अंकन केले आहे. तसेच, बाजूला बळीराजाची बायको, शुक्राचार्य व प्रसंगाचे साक्षीदार, ब्रह्मदेवाचे चतुर्भुज शिल्प आहे. मूळ मंदिरावर ही मोठ्या आकाराचा बळीराजा छोट्या वामन बटूला दान देताना उदक सोडतो आहे, असे याच अवतार कथेसंबंधीचे शिल्प आहे.

यादवकालीन रामनारायण मंदिर अर्थात खोलेश्वर मठ 

१३ व्या शतकातील खोलेश्वराची कन्या लक्ष्मी निर्मित खोलेश्वर मठ मंदिराचा आढावा आपण आजच्या लेखात घेणार आहोत. आज जैत्रपाल गढी परिसरस्थित मंदिराचा परिसर, त्या काळात ब्रह्मपुरी नावाने ओळखला जात होता. या मंदिराची पार्श्वभूमी व निर्मितीची विस्तृत माहिती आपल्याला मंदिरातील प्रवेशद्वाराच्या डावीकडील गुळगुळीत प्रस्तर शिळेवर कोरलेल्या संस्कृत- मराठी अभिलेखातून मिळते. यादव सेनापती खोलेश्वर व त्याचा मुलगा रामदेव यांच्या विविध पराक्रमाची प्रशस्ती या लेखात नोंदविलेली आहे. मंदिर पूर्ण होण्याचा व लेखाचा काळ शके ११६२ दिला असून, तिथीप्रमाणे तारीख शनिवार, २७ आॅक्टोबर सन १२४० येते. प्रशस्तीकाराचे नाव वाग्देवता भट्ट ( संस्कृत- वागीश कविराज) असून नोवरें गावच्या रेमेयाचा मुलगा, जोईयाने हा २७ ओळींचा लेख खोदल्याची नोंद आहे.
   खोलेश्वर मंदीरातील शिलालेख
 देवभोगासाठी बांधडे गावातील २ मळे व ३ घाणे दिलेले आहेत. मुखमंडप, दोन अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ, चौकोनी गर्भगृह व निरंधार प्रदक्षिणा मार्ग, असा सर्वसाधारण तलविन्यास आहे. मंदिर ५ फूट उंच जोत्यावर उभे आहे व पायर्‍या चढून मुखमंडपातून आपण मंदिरात प्रवेश करतो. मंदिराला मुखमंडपाखेरीज वामनभिंती असलेले दोन अर्धमंडप आहेत. जे आज विटांचे बांधकाम करून बंद केलेले दिसतात.
Yadav kula's The Ramayana Narayan Temple or Kholeshwar Temple | यादवकालीन रामनारायण मंदिर अर्थात खोलेश्वर मठ
        अर्धमंडपात व मुखमंडपात बसण्यासाठी कक्षासने केली आहेत. चौरस सभामंडपात स्तंभाची अष्टकोनी रचना करून त्यावर पेललेल्या दगडांच्या वर्तुळाकार रचनेआधारे छत उंच नेलेले आहे. या छताच्या प्रकाराला ‘उक्षिप्त वितान’ असे म्हणतात. वर्तुळाकार रचनेच्या मध्यभागी दगडाचे पुष्पशिल्प बसविले आहे. या भव्य सभामंडपात मध्यभागी भौमितिक चौरस पीठावर वर्तुळाकार रंगशीला बसवलेली आहे. मंदिरातील एकूण स्तंभ ३२ असून, ते दोन वेगवेगळ्या चौकोनी आकाराचे, उत्तर यादवकालीन शिल्पविरहित आहेत.
         सभामंडपाच्या मागील बाजूस दोन फांसना शिखरे असलेली देवकोष्ट असून, एकात शेंदूर लावलेली गणेशाची व दुसर्‍यात खंडित नृत्यशिवाची मूर्ती आहे. नृत्यशिवाची मूर्ती अष्टभुज असून भुजंगत्रास मुद्रेतील आहेत. खाली शिवगण विविध वाद्ये वाजवताना दाखविले आहे. अंतराळातील देवकोष्टे चार थरांची फांसना शिखरयुक्त असून, एकात छोटी भैरव मूर्ती व दुसर्‍यात तांदळा आहे.
   गर्भगृहाची द्वारशाखा पंचशाखा नंदिनी प्रकारची असून, विलक्षण सुंदर आहे. व्याल, पत्र स्तंभ आणि रत्न शाखेबरोबरच येथे वीर नराची शाखा असणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. खोलेश्वर पुत्र रामदेवाच्या पराक्रमी मृत्यूची आठवण करून देणारे हे वीर, प्रभावी युद्ध आवेशात कोरले आहेत. द्वारशाखेच्या पायापाशी वैष्णव द्वारपालांच्या खंडित मूर्ती आहेत. ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहात आज शिव पिंड आहे. जी नंतरच्या काळात आहे. मंदिरातील मुख्य मूर्ती आज अस्तित्वात नाही. गाभार्‍यात एक खंडित उमा महेश्वर आलिंगन मूर्ती ठेवलेली आहे. याखेरीज सभामंडपात एक पूर्व मध्ययुगीन ब्रह्मदेवाची द्विभुज मूर्ती आहे. हातात सृक व पुस्तक आहे. पायापाशी हंस आणि चौरीधारी दासी कोरलेली आहे.
      गर्भगृह, अंतराळ व सभामंडपाच्या बाह्यभागावर चौकोनी पीठ, रत्न थर, पद्म, कुंभ, थर दिसतात. कुंभ भागावर विशिष्ट ठिकाणी देवता मूर्तीचे अंकन आहे. जंघेवर कुमुद, पद्म, केवल हे थर असून वर अर्धस्तंभाची मालिका कपोतापर्यंत नेलेली आहे. सभामंडप चौकोनी आकाराचा असून गर्भगृह चौरस आहे व पंचरथ आहे. उत्तर, पश्चिम व दक्षिण बाजूंना तीन देव कोष्ट असून, त्यात अनुक्रमे नटेश्वर शिव, विष्णू व विदीर्ण नरसिंहाच्या मूर्ती आहेत. याव्यतिरिक्त बाह्यभागावर शिल्पांकन आढळत नाही. मूळ शिखर, जे कदाचित विटांचे असावे. आज ते अस्तित्वात नाही. बाह्य मूर्तींवर व बाह्य भागावर चुना, रंग लावल्याने ह्या मूर्तींची ओळख पटणे अवघड झाले आहे. मंदिर परिसरात नाग शिल्प व काही वीरगळ आढळतात. मंदिरामुळे पराक्रमी स्मृतींना उजाळा द्यावा!

सखलेश्वर मंदिर :-

   अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सकलेश्वर मंदिर लेणी मंदिर आहेत. सकलेश्वर मंदिर  याला बाराखांबी म्हणतात कलात्मक व खास रूपगर्वितांच्या शिल्पामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची उभारणी शके ११५० म्हणजेच इ.स. १२२९ मध्ये झाल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. 
 
मध्ययुगीन कालखंडातील हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून या मंदिराची उभारणी सिंघनदेव यादवांचा सेनापती खोलेश्वराने केलेली आहे. या ठिकाणच्या दुर्लक्षित बाराखांबी परिसरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सीताफळाचे झाड मुळासकट काढताना अनेक देवदेवतांच्या शेकडो शिल्प व शिलालेख सापडले आहेत. याच संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले तेव्हा  या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे. उत्खनन सुरू असतांना नवीन मंदिराची रंगशिळा निघाली तर अनेक दुर्मिळ मूर्तींसह नवनवीन अवशेष हाती लागू लागले आहेत.
    ११ व्या शतकातील यादवकालीन व चालुक्यांचा प्रभाव असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालयच्या वतीने १८ मार्चपासून उत्खननाचे काम सुरू झाले आहे. मंदिराच्या उत्तर व दक्षिण बाजूने उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन सुरू होताच उत्तर बाजूला नवे मंदिर सापडले. ढिगाऱ्याखाली दडलेल्या या मंदिराची मोठी रंगशिळा पायाभागात निघाली तर द्वारशाखेच्या बाजूला असणारी एक विष्णूची पुरातन सुंदर अशी मूर्ती सापडली आहे. तसेच चुन्यापासून तयार केलेल्या मूर्तीचे भाग, तत्कालिन खापरी भांडयाचे तुकडे, दगडाप्रमाणेच  घडविलेल्या विटा, अशा अनेक दुर्मिळ वस्तू उत्खननातून निघाल्या आहेत. तर दक्षिण-पश्चिम बाजूस झालेल्या उत्खननात दगडी शिळेच्या पुरातन पायऱ्या निघाल्या.
      या पायऱ्यांवर गजधर आढळून आलेला आहे. तर मंदिराच्या पूर्वेकडे समोरील बाजूस मोठे कुंड असून या कुंडाचे खोदकामही होणार आहे. पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक कार्यालयातील सहा अधिकारी व कर्मचारी यांचे पथक अंबाजोगाईत तळ ठोकून आहेत. यात तंत्रसहाय्यक, निलिमा मार्केडे, पुरातत्व समन्वयक मयुरेश खडके, स्नेहाली खडके, कामाजी डक, मुश्रीफ पठाण, सर्वेक्षक प्रल्हाद सोनकांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खननाचे काम गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. 
found new temple in excavation at Ambajogai | अंबाजोगाईत उत्खननातून मंदिराचा लागला शोध; रंगशिळा, दुर्मिळ मूर्ती सापडल्या
 




 
 
तीन मंदिरांची शृंखला
संकलेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननाचे काम सुरू झाल्यानंतर एक नवीन मंदिर उत्खननातून पुढे आले. सध्या असलेल्या संकलेश्वर मंदिराच्या उत्तर बाजूस दोन्ही मंदिरे असावीत असा अंदाज पुरातत्व खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शिवमंदिराच्या बाजूला तीन मंदिरे असल्याचा शोध ठिकठिकाणी लागलेला आहे. याही ठिकाणी तीन मंदिरांची शृंखला  असावी असा अंदाज वर्तवून उत्खननाचे काम सुरूच आहे. 

‘त्या’ ७० ते ८० मुर्त्या सुरक्षित
दीड वर्षापूर्वी अंबाजोगाई येथील काही हौसी नागरिकांनी संकलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवितांना जेसीबीच्या सहाय्याने मंदिर परिसरातील मुर्त्या हलविल्या या प्रकारामुळे मुर्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. ही घटना पुरातत्व खात्याला कळाल्यानंतर पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी  दखल घेऊन त्या मुर्त्या सुरक्षित स्थळी हलविल्या.आता पुरातत्व विभागाने तयार केलेल्या नवीन शेडमध्ये त्या मुर्त्या स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. त्या सर्व मुर्त्या सुरसुंदरी,साधक, विष्णू, शिव यांच्या असून बऱ्याच मुर्त्यांची झीज झाल्याने त्या ओळखता येत नाहीत. मात्र, या सर्व मुर्त्यांवर दक्षिणात्य शिल्प शैलीचा प्रभाव दिसून येतो.

   चौबारा गणेश मंदिर

यादव कालीन अंबानगरीच्या वैभवसंपन्न काळात चारही बाजूनी येणाऱ्या रस्त्याच्या ऐन मध्यावर ( चौबर ) असलेले हे गणेश मंदिर आहे. या ठिकाणी असलेला शके ११५० चा शिलालेख तत्कालीन अंबानगरीच्या वैभवाचे वर्णन करतो. 

   गणेश मंदिर म्हणजे उंच अधिष्ठानावर उभारण्यात आलेला उंच मंडप आहे. वितानावर गोखूराच्या आकाराची नक्षी आहे. शिखर सुस्थितीत आहे. वितान करोटक पद्धतीचे पण उंच आहे. मंदिराच्या आत छताला अप्रतिम कोरीव काम आहे. 

   या मंदिरापासून पश्चिमेकडे जाणारा रस्ता जवळच्याच खोलेश्वर मंदिराकडे जातो. पूर्वेकडे जाणारा रस्ता वेस कडे जातो. जिथे तत्कालीन मारुती मंदिर आहे. उत्तेरकडे जाणारा रस्ता काशीविश्वनाथ मंदिराकडे जातो तर दक्षिणेकडे जाणारा रस्ता राममंदिराकडे जातो. 




 
   केवळ चौदा स्तंभावर उभारलेला हा मंदिर मंडप आतून शिखरावर अप्रतिम कोरीव काम केलेला आहे. शिखराच्या नक्षीच्या सर्वात खालच्या स्तरावर यादव दरबारातील मान्यवरांच्या मूर्ती असाव्यात. त्यावरील स्थरावर नृत्य सुंदरी आणि त्याहीवर सुंदर नक्षीकाम असे शिखर चे स्वरूप आहे. गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूस याक्षणी आहेत. तत्कालीन अंबाजोगाईच्या वैभवाचे वर्णन करणारा शके ११५० चा शिलालेख उजव्या बाजूला दर्शनी भागावर लावलेला आहे. 

   काशी विश्वनाथ मंदिर

खोलेश्वर मंदिराशी विलक्षण साम्य असणारे आणि साधरणपणे उत्तर यादव काळात बांधलेले हे मंदिर आहे. खोलेश्वर मंदिरासमोरून रविवार पेठेकडे जाणाऱ्या मार्गाच्या शेवटी असणाऱ्या वेशी बाहेर गेल्यास लगेच हे मंदिर दिसते. मंदिराच्या बाह्य भागावर क्षिप्त उक्षिप्त असे वितान दिसते. काही ठिकाणी पद्मपट्टा आणि गजराथ दिसतात. काही मुर्तींचे अवशेष इतस्त: पडलेले आहेत. मंदिरातील स्तंभ यादवकालीन कोरीव काम केलेले आहेत. मुख्य मंडपात रंगशिळा आहे. द्वार शाखेवर सुंदर नक्षीकाम आहे. एकूण मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि अर्ध मंडप अशी आहे. मुलूत: पूर्व, दक्षिण आणि उत्तेरकडून प्रवेशद्वार आहेत परंतु सध्या फक्त पूर्व प्रवेशद्वार चालू आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला तलाव आहे.

   बुट्टेनाथ आणि नागनाथ परिसर

जयंती आणि वाण नदीचा संगम असलेला ठिकाण हे अनेकविधी प्रकारच्या औषधीयुक्त वनस्पतींनी समृद्ध आहे. निसर्गरम्य अशा या ठिकाणी एका उंच कड्याच्या मध्यावरील. कपारीत बुट्टेनाथ हे शिवलिंग आहे. येथे सापडणाऱ्या जडीबुटीमुळेच बुट्टेनाथ हे नाव पडले असावे.

या ठिकाणापासून जवळच दोन डोंगराच्या मध्ये एका रमणीय ओहोळाच्या काठी घाट नागनाथ देवस्थान आहे. मंदिराचा परिसर छोटे मोठे धबधबे आणि जैवविविधतेने नटलेला आहे. करंज, महारुख, वड, पिंपळ, गुलमोहर अशा वृक्षराजींनी आणि मोर, स्वर्गीय नर्तक, टकाचोर, बुलबुल, नीलिमा, तांबट, शृंगी घुबड, धीरव, गरुड अशा अनेक प्रकारच्या पक्षांनी हा परिसर समृद्ध आहे. पावसाळ्यामध्ये हा परिसर हिरवागार होतो. डोंगरदऱ्यांवरुन धबधबे वाहू लागतात. वातावरणात प्रसन्नता साठून राहतो.

येथून जवळच पंढरकडा पर्वतातत उंच कड्याच्या एका गुहेत रेवणसिद्द यांचे साधना स्थान आहे. समोर नदीत विस्तीर्ण डोह साचला आहे. गुहेचा समोरचा भाग कोसळल्यामुळे गुहा नष्ट होत चालली आहे. अशा अनेक नैसर्गिक गुहा या डोंगरांमध्ये आहेत. येथील मडके फोडी नावाचा दोन उंच काड्यांच्या मधून पडणारा आणि पुढे अरुंद दरीतून वाहणारा धबधबा प्रेक्षणीय आहे. नागनाथ मंदिरामागे पावसाळ्यात अनेक छोटेछोटे धबधबे आणि ओव्हळ वाहत असतात. संत रामदास यांनी परिसरात येऊन विवेक सिंधूचे अवलोकन केले आणि त्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख दास विश्रामधाम या ग्रंथात केलेला आहे. 



   वैष्णव लेणी

अंबेजोगाईतील एकेकाळचे हे सर्वात सुंदर लेणे असावे. आज या लेण्याच्या प्रकारची बाह्य रेषा मात्र शिल्लक आहे. या लेण्यावरून निष्काळजीपणे बांधलेला पुलामुळे या लेण्याच्या बराचसा भाग झाकला गेला आहे. या लेण्याच्या मधूनच एक नाला वाहतो. साबणाच्या पाण्यामुळे आणि खडकाच्या ठिसूळपणामुळे या लेण्याची खुपच झीज झाली आहे.
अतिशय आकर्षक असे वीरभर्द्र, ब्रह्मा विष्णू महेश, अष्टभुजा देवी, गरुड, वराह यांच्या मूर्ती किंवा त्यांचे भग्न अवशेष आपल्या ला येथे पाहता येतात. परंतु अक्षम्य दुर्लक्षमुळे हे शिल्पवैभव अस्तंगत होत आहे.


 

रेणुकाई आणि मूळ जोगई

सकलेश्वर बाराखांबी मंदिरापासून जवळच रेणुकाई मंदिर रमणीय वृक्षराजीतील प्राचीन मंदिर आहे. मूळ मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पध्दतीचे कोरीव स्तंभाचे आहे. मंदिराच्या अंगालाच दोन्ही बाजूस छोट्या दोन ओवऱ्या आहेत. गाभाऱ्यात जाण्याच्या प्रवेशद्वारासमोर छोटेसे यग्न्यकुंड यग्नकुंड आहे. एका अष्टदळ कमळाप्रमाणे यंत्रही कोरलेले आहे. गाभाऱ्यात माहूरच्या रेणुकादेवी प्रमाणेच पण छोटा देवीचा तांदळा आहे.


मंदिराच्या समोर डाव्या बाजूला सिमेंटचा रस्ता आणि पायऱ्या जातात तिकडे गेल्यास मूळ जोगाईचे छोटेसे मंदिर आहे. योगेश्वरा देवी योगिणीसह प्रथम येथे प्रकट झाली अशी योगेश्वरी माहात्म्य या ग्रंथात कथा आली आहे. हे तेच ठिकाण म्हणून दाखवले जाते. या मंदिरात योगेश्वरी देवीच्या तांदळ्याप्रमाणेच पण छोटा तांदळा आहे. या छोट्याश्या मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. याच परिसरात एक अष्टभुजा देवीची महिषासुर मर्दिनी स्वरुपातील सुंदर पण भग्न मूर्ती आहे. बाजूने वाहणाऱ्या झऱ्यामुळे हा सगळाच परिसर अत्यंत रमणीय झाला आहे. रेणुकाई मंदिराकडून सकलेश्वर मंदिराकडे जाताना सुंदर जंगल रस्त्याने जाण्याचा आनंद मिळतो. जवळच रस्त्याच्या डाव्या बाजूस शबरी कुंड नावाचे तीर्थ कुंड आहे. तेथून पुढे गेल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूस आरोग्य वैद्यनाथ नावाचे छोटेसे शिवालय लागते. साधी बांधणी असलेल्या या मंदिराजवळच एका छोट्या डोंगरामध्ये एक नैसर्गिक गुहा आणि त्या गुहेत एक झारा आहे. स्थानिक लोक या ठिकाणाला सीतेची नहाणी असे म्हणता. आरोग्य वैद्यनाथ मंदिरामागे छोटे सुबक सुंदर असे तीर्थकुंड होते ते आता बुजत चालेले आहे.

त्तीखाना लेणी :-


 
 
  अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सीमेजवळील जयंती नदीच्या काठी तीन लेणी सापडतात. त्यात २ शैव आणि एक जैन प्रकाराच्या लेणी आहेत. त्यातील शैव लेणी ही लेणी ‘हत्तीखाना’ म्हणून ओळखला जातो. हत्तीखाना ही अजिंठा-वेरूळ प्रमाणेच बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध लेणी आहे. या लेणीच्या निर्मितीलाही साधारणतः १००० वर्षाचा इतिहास आहे.
हत्तीखाना हे लेणी स्थळ मानवनिर्मित आहे की चमत्कार याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत. काही इतिहासकारांच्या मते या लेणीची निर्मिती अकराव्या शतकामध्ये झाली जेव्हा या परिसरात देवगिरीच्या यादवांचे राज्य होते. चार टेकड्या फोडून तेथील खडकांमध्ये हत्तींचे शिल्प कोरण्यात आले. तसेच लग्न मंडप आणि सभामंडपाची देखील निर्मिती करण्यात आली. येथील लग्नमंडपात शंकराचे वाहन नंदीचेही शिल्प कोरले आहे. तसेच सभामंडपाची निर्मितीही ३६ खांबावर केली आहे. आणि सभामंडपाच्या भिंतींवर मुर्त्यांचे शिल्प कोरले आहे. हत्तीखाना हे स्थळ जैन लेणी किंवा शिव लेणी म्हणूनही प्रसिद्ध आहे.पण काही अभ्यासकांच्या मते अंबेजोगाईच्या लेण्यादेखील राष्ट्रकूटकालीन आहेत. हत्ती हे राष्ट्रकूटांच्या सामर्थ्याचे प्रतिक. वेरुळच्या कैलासलेणीप्रमाणेच येथे हत्ती आहेत. पुण्यातील पाताळेश्वर आणि वेरुळच्या दशावतार लेणीतील सभामंडपाचे येथील सभामंडपाशी कमालीचे साम्य आहे. द्वारांवरील शिल्पे शैव द्वारपालांची आहेत. जी वेरुळला रामेश्वर लेणीत दिसतात.
      हत्तीखाना लेणी बद्दलची दुसरी दंतकथा म्हणजे या लेणीचे निर्माण एका चमत्कारातून घडले असे सांगितल्या जाते. योगेश्वरी देवीचा परळी येथील वैद्यनाथ देवाशी विवाह ठरला होता. परळी वैद्यनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले धार्मिक स्थळ. पण लग्नाच्या पूर्वी एका ऋषींकडून श्राप मिळतो की लग्न जर सूर्योदयापूर्वी म्हणजेच कोंबडा बांग देण्यापूर्वी पार नाही पडले तर संपूर्ण लग्न मंडपाचे रूपांतर दगडामध्ये होईल. दुर्दैवाने कोंबड्याने बांग देण्यापूर्वी हे लग्न पार पडले नाही आणि येथील मंडप तसेच सर्व सजीवांचे दगडा मध्ये रूपांतर झाले. येथे दिसणारे हत्तीचे शिल्प म्हणजे त्याकाळी जिवंत हत्ती असल्याचे बोलले जाते. येथील नंदीचे शिल्प म्हणजे वैद्यनाथ देवाचा खरा नंदी असल्याचे बोलले जाते. कदाचित यामुळेच तेथे नंदीचे शिल्प सापडते पण शंकराचे मंदिर दिसत नाही. शंकराचे मंदिर हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने परळी येथे दिसते. 


    हत्तीखाना बद्दलची वास्तविकता जी काही असेल ती असेल. पण साधारणतः अकराव्या शतकापासून तरी या लेणीचे संदर्भ इतिहासकारांकडून मिळतात. या लेणी मध्ये एक भुयारी मार्ग असल्याचे देखील सांगितले जाते. हा भुयारी मार्ग २७ किलोमीटर दूर परळी-वैद्यनाथ मंदिराच्या मागे निघतो असे म्हणतात. 
लेणीची झालेली दयनीय अवस्था
हत्तीच्या दगडी पुतळ्यांची झालेली दुरवस्था
लेणीच्या परिसरात वाढलेली झुडुपे आणि अस्वच्छता
लेणीच्या ठिकाणी पडलेला कचरा
या पर्यटन स्थळाला एक हजार वर्षाचा ऐतिहासिक, धार्मिक वारसा असूनही आज हा वारसा मोडकळीस आल्याचे जाणवते. येथील स्थानिक प्रशासन आणि पुरातत्त्व खात्यातर्फे म्हणावी तशी पर्यटन स्थळाची जपणूक झालेली दिसत नाही. हत्तीखानाच्या परिसरात अस्वच्छताही प्रचंड जाणवते. येथील शिल्पांवर स्वतःचे नाव कोरणारे महाभागही सापडतात. ही लेणी कदाचित मुंबई-पुणे सारख्या शहरी भागाजवळ असती तर नक्कीच आपोआप जपणुकही झाली असती.


   आंबाजोगाई इथल्या योगेश्वरी मंदिराच्या वायव्येला केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर, जयंती नदीच्या डाव्या किनाऱ्यापासून २०० मीटरवर इ. स. १०६६ मधे खोदण्यात आलेली मंदिरं आहेत. यांना हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी गुहा, जोगाई मंडप किंवा जोगेश्वरी देवी लग्न मंडप असंही म्हटलं जातं. १०६० ते १०८७ या काळात शासन करणाऱ्या उदयादित्य राजाच्या काळात ही लेणी खोदली गेली. आज ही लेणी महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराशास्त्रीय स्थळे आणि अवशेष १९६०च्या अधिनियमानुसार संरक्षित केलेली आहेत. चौकोनी आकाराच्या या लेण्यांचं प्रवेशद्वार दक्षिणेकडे असून प्रवेशद्वाराजवळ खडकात कोरलेले हत्तीचे दोन भव्य पुतळे दिसतात.या शिल्पांमुळे त्याला हत्तीखाना किंवा हत्तीलेणं हे पण नाव लाभलंय. ​बहामनी काळात या जागेचा उपयोग हत्ती पाणी पिण्यासाठी करत होते, असेही संदर्भ सापडतात. 
     अंबेजोगाई ला देवीच्या मंदिरात दर्शन आटोपल्यावर बाहेर पडण्यापूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या यज्ञकुंडाच्या बाजुला ओसरीत अंबेजोगाई गावातील ऐतिहासिक प्राचिन प्रेक्षणीय स्थळांची सचित्र माहिती दिलेली आहे,त्यात मंदिरापासुन जवळच हत्तीलेणं आहे,फार चढायला उतरायला लागत नाही व दासोपंत व मुकुंदराजांच्या समाधीच्या रस्त्यावरूनच या लेण्याला जाता येतं.देवीच्या मंदिराकडेजाताना भक्तनिवासाच्या थोडं अलिकडेच डाव्या हाताला एक वाट जाते,ती सरळ हत्तीलेण्यापर्यंत.
      हत्ती लेण्यांचं वैशिष्ट्य हे आहे की हे लेणं डोंगर कोरून बनवलेलं नसून जमिन खोदून बनवलेलं आहे.लेण्यात जाण्यासाठी जमिन खोदून चार-पाच पायऱ्या जमिनीखालून लेण्याच्या आवारात जातात.वर जमिनीची कमान आहे व खालून पायऱ्या उतरून आपण लेण्याच्या आवारात प्रवेश करतो.लेणी बघण्यासाठी आत शिरल्यावर आपल्याला   मोठा धक्का बसतो.
लेणीची झालेली दुरवस्था
लेणीची झालेली दुरवस्था
लेणीच्या ठिकाणी असलेल्या मंदिराची झालेली दुरवस्था
 एखाद्या कचरापेटीत नसेल एवढा कचरा आत पसरलेला आहे. कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, वेफर्सची रिकामी पाकिटं, चॉकलेटसची वेष्टनं हा कचरा लोकांनी करुन ठेवला आहे. कचरा परवडला, पण त्याहून भयानक प्रकार म्हणजे इथल्या तळीरामांनी या ठिकाणाला चक्क दारूचा अड्डा बनवून टाकलेलं दिसत होतं. जागोजागी फुटलेल्या बाटल्या आणि काचांचे तुकडे पडलेले दिसत होते. परिस्थिती एवढी वाईट आहे की आत चालताना खाली पाहून, अक्षरश: जपून चालावं लागते. आत उतरायला दगडी जिना, त्यासमोर गोलाकार छत असलेले नंदीचं देऊळ, आणि समोर चौकोनी खांब असलेले चौकोनी आकाराचंच मुख्य मंदिर अशी या लेण्यांची रचना आहे.
 पर्वताच्या उतारावरील ही लेणी पाहता पुण्यातील पाताळेश्वर लेण्यांची आठवण येते. तीन लेण्यांपैकी एक शैव लेणी काळाच्या पडद्याआड गेली असून; एक जैन आणि एक शैव लेणी तुर्तास तरी अस्तित्वात आहे.
शैव लेणीमध्ये सभामंडप, एका कातळात कोरलेला नंदी मंडप दिसून येतो. गर्भगृहाबरोबर वास्तव्य करण्यासाठी ३ खोल्या देखील आहेत. चार ओळींमध्ये आठ खांबावर (३२ खांब) लेण्यांचा भार आहे. लेण्यांसमोरील मोकळ्या जागेत मोठ्या पाषणातील चार हत्ती आहेत. चार ही बाजूने प्रवेश करता येण्याजोगे नंदीमंडप येथील आकर्षण ठरते. शेजारील तुटलेला ध्वजस्तंभ गतवैभवाची आठवण करुन देतो. सप्तमात्रिका, तांडव करणारा शिव, महिषासूरमर्दिनी, भैरव, वामन अवतार, त्रिविक्रम, नरसिंह आणि शेषशाही विष्णू यांची शिल्पे पाहताना एलोरा येथील शिल्पांची जाणीव होते. वास्तू दुलर्क्षित असल्याने शिल्पांना संवर्धनाची गरज आहे.
लेणं खुप प्रशस्त व ऐसपैस आहे. आत प्रवेश केल्या बरोबर आपल्या उजव्या व डाव्या दोन्ही बाजूला हत्तींचं शिल्प बनवलेलं आहे.









समोरच नंदीमंडप आहे.लेणी मंडपाच्या आत साडेआठ चौरस मीटरचं प्रांगण आहे. हा मंडप चार दगडी स्तंभांवर तोललेला आहे. 



प्रांगणामधे कुशलतेनं खोदलेला ९.१४ x ९.१४ मीटर आकाराचा नंदी मंडप आहे. मध्यभागी नंदीची मूर्ती आहे. प्रांगणाच्या चारही बाजूंना चार हत्ती आहेत. यातील एक हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो.  या लेण्यांचे सौदर्य वाढवले आहे चार कोप-यात असलेल्या चार हत्तींनी. ह्या हत्तींची आज पडझड झाली असली तरी त्यांचं सौदर्य मात्र तसूभरही कमी झालेलं नाही. ऐन भरात असताना या लेण्यांचा थाट कसा असेल हा विचार मनात आला की अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.





जैन धर्माच्या इतिहासाची ओळख करुन देणारी लेणी येथे दिसून येते. लेण्यांच्या तीन बाजूस मोकळ्या जागेत मोठे मंडप आहेत. मंडपात पूजा करण्यासाठी जैन तीर्थंकरांची कोरलेली शिल्पे आहेत. मंडपात काळ्या पाषाणात एकाच लांबीचे दोन कोरलेले हत्ती आहेत. त्यांपैकी एक हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने वा अनुदान न मिळाल्याने ती अपूर्ण राहिल्याचे मत लेणी अभ्यासकार आणि जाणकार नोंदवतात. लेण्यांच्या उजव्या बाजूला तीर्थंकर तर डाव्या बाजूला पार्श्वनाथ यांचे भग्नावशेष दिसून येतात. जयंती नदीच्या पुरामुळे यांची हानी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मंडपात १३ जैन तीर्थंकर, पार्श्वनाथ यांची बैठी प्रतिकृती, उभे तीर्थंकर लेण्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्याच बरोबर काताळात मोठ्या प्रमाणात कोरीव काम केल्याचे दिसते. किंबहूना राष्ट्रकुट काळातील व्यापार व्यवस्थेचे चित्रण काताळात रेखाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. शिवाय चौमुख, चौरी घेतलेल्या स्त्रीचे शिल्प, हार घेतलेल्या विद्याधराचे शिल्प, शिरविरहीत स्त्रीची शिल्पेदेखील आहेत. घोड्यावरील पुरुषांसह विषम संख्येतील स्त्री-पुरुष व्यापार करत असल्याचे तर्क जाणकार लावतात. लातूरमध्ये या लेण्याची साधर्म्य असणारी ‘खरोसा’ची लेणी आहेत.
    लेण्या बघतांना मनात विचार येतो तो या लेण्या बनवणाऱ्या शिल्पकारांचा.त्यांना भुगर्भातील दगडाच्या रचनेचा किती अभ्यास असावा ना! जमिन कुठपर्यंत खोदत न्यायची,खोदलेल्या जमिनीत कुठेपर्यंत लेण्या कोरायच्या? कारण समजा दहा फुट कोरत न्यायचं ठरवलं असेल आणि दगड जर दहा फुटांपूर्वीच संपला तर सगळेच श्रम वाया जाण्याची भीती होती. हे प्रचंड हत्ती पण मुळ दगडातूनच खोदताना कोरलेले असावेत…थोडीफार जरी चूक झाली तर सगळं शिल्प विद्रुप झालंच असतं पण पूर्ण लेण्याच्या सौंदर्याला बाधा आली असती. आजही हत्तींच्या झिजलेल्या शिल्पांवरील झुलीतलं नक्षीकाम आपण बघू शकतो.
         मंडपात नंदीचं शिल्प मुख्य लेण्याकडे तोंड करून बसवलेलं आहे.या नंदीमंडपाच्या डाव्या व उजव्या बाजुला समोर पण हत्तीचं शिल्प आहे.नंदीमंडप व लेण्यांची भिंत यामध्ये छत नाही त्यामुळे भरपुर हवा व सूर्यप्रकाश येतो.


     या नंदीमंडपाजवळच प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला एक कुंड आहे. ते कुंड पाण्याने तुडूंब भरलेलं असते.परंतू पाण्याचा वापर किंवा उपसा नसल्यामुळे पाणी शेवाळलं होतं.हे पाणी पावसाचं जमा झालेलं होतं की कुंडात पाण्याचा झरा आहे याची माहिती देणारं कसलाही माहितीफलक किंवा कोणी पुरातत्व विभागाचा कर्मचारी तिथं नाही.
     नंदीमंडपासमोर मुख्य शिवलेणं आहे.शिवलेण्याला चांगलाच प्रशस्त वऱ्हांडा सोडला आहे व त्यानंतर भिंतीमध्ये दरवाजा असून छोटे छोटे कक्ष आहेत.एका दाराच्या दोन्ही बाजुला कोरलेले प्रचंड शिल्प बघुन माहुरच्या पांडवलेण्यातील द्वाररक्षकांच्या शिल्पांचीच आठवण येते. भिंतीवर कधीकाळी अनेक शिल्पं कोरलेले असावेत याची स्पष्ट चिन्हं दिसतात.तसंच कधी काळी या शिल्पांना रंग पण दिला असावा .या लेण्यामध्ये  एक विशेष बाब जाणवली ती ही की इथे मूर्तीभंजकांचा उपद्रव होण्यापेक्षाही निसर्गाचा या शिल्पांवर प्रभाव पडला होता.कालौघात इथली सगळी शिल्पं झिजून गेली आहेत.आतल्या छोट्या गुहांच्या दरवाज्यावर काही मूर्त्या दिसतात, पण प्रयत्न करूनही त्या कुणाच्या हे काही ओळखता येत नाही.गर्भगृहं मात्र पूर्णपणे रिकामी आहेत, तिथं आत्ता एकही मूर्ती नाही.


     



 
 32

33

34

35

36

लेण्यांतील गुहांचा अंतर्भागही पूर्वी खूप आकर्षक असावा. लेण्यांतील एक गुहा ३२ खांबांवर तोललेली आहे. तिथे शंकर आणि गणपतीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. पूर्वेला एक सभामंडप आहे. त्यात तीन प्राचीन गर्भगृहं असावीत. नंदीमंडपाच्या शेजारी एक तुटलेला मानस्तंभ असावा. तो असावा असं दर्शविणारी एक गोलाकार संरचना आजही शिल्लक आहे. इथे एक शिलालेख सापडला होता. तो अंबाजोगाईच्या तहसीलदार कार्यालयात सुरक्षिततेसाठी हलविण्यात आल्याचं कळलं. या शिलालेखात महामंडलेश्वर उदयादित्य या राष्ट्रकूट राजाने सेलू, राडी, जवळगाव आणि कुंभेफळ ही गावं लेण्यांच्या देखभालीसाठी इनाम म्हणून दिल्याचा उल्लेख आढळतो. डोंगर उताराच्या सपाट भागावर आणि त्या काळच्या समृद्ध नदीकाठी ही लेणी खोदली गेली. 
     लेणी बघून काहीसे उदास मनानं आपण बाहेर पडतो. जर फ्रान्स, इंग्लंड या देशात असती तर ही लेणी आज अख्ख्या जगात लोकप्रिय असती, भारतात ती त्यांच्या जिल्ह्यापलीकडे कुणाला माहिती नसतील! एका नविन मंदिरासाठी २००० कोटी रुपये जमवणा-या या देशातल्या लोकांना त्याच देशातल्या हजार वर्षे जुन्या लेण्यांची आजची दयनीय स्थिती पाहून किंचितही दु:ख होत नाही हीच त्याची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.
संदर्भः-
१) बीड जिल्हा गॅझेटीयर
२)  www.misalpav.com या संकेतस्थळावरील लेख
३) https://shriyogweb.wordpress.com/2017/10/21/ हा ब्लॉग
 ४) डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचा महाराष्ट्र टाइम्स मधील लेख
५) सनातन प्रभात संकेतस्थळावरील लेख
६) https://ambajogaitourism.com हि वेबसाईट
७)  सौ. साईली कौ. पलांडे-दातार यांचे लिखाण
८)  https://www.tarunbharat.net/Encyc/2021/5/5/Ambajogai.html हा लेख
९) मराठी विश्वकोष
१०) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के.घाणेकर







अंबाजोगाई शहरातील आद्यकवी मुकुंदराज रस्त्यावर हत्तीखाना (भूचरनाथ शैव लेणी) असून शहराचे प्राचीन वैभव आहे. हत्तीखान्यात पाषाणापासून तयार करण्यात आलेले मोठमोठे हत्ती, सभामंडप, ओवऱ्या पाहण्यासारख्या आहेत. सभामंडपातील शिलालेखात परिसरातील गावांचा उल्लेख असून या शिलालेखावरून ही वास्तू शके १०६६ मधील असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. लेखात शेवटी शापवचन आहे की, जो कोणी राजाचे म्हणणे एेकणार नाही त्यावर योगिनीचा वज्रदंड कोसळेल, असे सांगितले जाते.












https://www.lokmat.com/blog/aurangabad/renovated-artistic-amleshwar-temple/


योगेश्वरी देवळात आहे तो गधेगाळ आहे. खोलेश्वर हा सिंघण (दुसरा) ह्याचा सेनापती. आंबे गावात ह्याचे दोन लेख आहेत. एक बहुधा हा योगेश्वरीतील गधेगाळावरील असावा.
दुसरा लेख हा खोलेश्वर मंदिराच्या भिंतीत आहे. ह्याचे छायाचित्र दिसले नाही. खोलेश्वराची कन्या लक्ष्मी हिने रामनारायणाचे देऊळ बांधले असा उल्लेख त्या लेखात आहे. लेखात सिंघण यादव आणि खोलेश्वर ह्याची प्रशस्ती गायिली आहे. कालांतराने हे रामनारायणाचे देऊळ खोलेश्वराचा मठ ह्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि सध्या हेच नाव प्रचलित दिसतेय.
अमलेश्वराचे मंदिरही भारी दिसतेय.

एकदा आंबेजोगाईला जावेच लागेल. कचकून अवशेष आहेत.


मुकुंदराजांपर्यंत तुम्ही गेलेलाच मग थोडं पुढे बुट्टेनाथ आणि नागनाथला गेला नाही का?

बुट्टेनाथ जरा उंचीवर अवघड कपारीत आहे, तरी पण तिथे मिनी फ्रीस्टाईल रॉक क्लाइबिंग करत जायला मज्जा येते. रिस्की आहे खरं!


(वैजनाथाच देऊळ)


"योगेश्वरी"..................
अतिशय पुरातन पण अतिशय सुंदर असं "हेमाडपंथी शैलीचं मंदिर".
(देवळात फोटो काढायची परवानगी नाही , म्हणून आंतरजालावरून साभार )

देवीची मुद्रा बघून भवताल विसरायला होतं.....

"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बक्ये गौरी , नारायणी नमोस्तुते"
हेच भाव दाटून येतात.बऱ्याच कोकणस्थ ब्राम्हणांची "कुलस्वामिनी " आहे ही. मला तिच्या चरणांशी बसून अभिषेक करण्याचा योग आला. देवीची मूर्ती सुद्धा "करारी", डोळे ऊर्ध्व दिशेकडे रोखलेले .
अभिषेक झाल्यावर नेवेद्य. पण तो १२ वाजता असतो, मग मधल्या वेळात आसपास च्या परिसरात भटकायला निघालो.
पहिलं ठिकाण कवी मुकुंदराजांची समाधी - एका डोंगरातल अतिशय रमणीय ठिकाण , इथे म्हणे मोर दिसतात. आम्हाला पण एक दिसला पण तो खूप लांब होता.समोरची दरी सुद्धा रमणीय दिसत होती.


बाकी पावसाची रिप रिप सुरु असल्याने वातावरण अतिशय "प्रसन्न" झालं होत.



त्यानंतर "योगेश्वरी" देवीचं मूळ मंदिर बघितलं.


तिथून पुढे एक "शिवाचं" प्राचीन देऊळ, इतर भग्नावशेष आणि दासोपंतांची समाधी पाहिली

धर्मशाळा

जागोजागी असे हत्ती दिसत होते..... आता सगळे भग्न झालेत पण .....



त्यातल्या त्यात माझी फोटूग्राफी


हे बघून रत्नाकर मतकरी यांच्या "गहिऱ्या पाण्याची " आठवण झाली

काही भग्नावशेष आणि तुटलेली दीपमाळा

मधेच मेंढ्यांचा कळप दिसला .. मग प्रत्येकाने फोटू काढायची हौस भागवून घेतली.

नुकताच पावसाळा संपलेला असल्याने.... रानफुलांचा जणू उत्सव त्या डोंगरावर फुललेला होता.....
त्यातल्याच काहींना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केलाय.... कॅमेरा अतिशय सामान्य असल्याने विशेष काही टिपू शकलो नाहीये...

निळाई

त्यातच वेगळी "शेड" सुद्धा .. निसर्गाची कमाल आहे

या फुलांपेक्षा लहान फुलं मी आजवर कुठेही पाहिलेली नाहीत........

हे सगळं बघेपर्यंत १२ वाजत आलेले होते, देवीच्या नेवेद्याची वेळ झालेली होती....
परतलो , जेवलो, देवीच दर्शन घेऊन ते रूप डोळ्यात साठवत...





















































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...