Thursday, December 30, 2021

पन्हाळे-काजी लेणी-समूह (Rock-cut caves at Panhale-Kaji)

  रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ.दापोलीतून सुमारे २८ किलोमीटर तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी. अंतरावर थोरली-धाकटी कोटजाई नदी आहे. या नदीजवळ ‘पन्हाळेकाजी’ हे गाव आहे. नदीला उत्तराभिमुख असलेल्या डोंगरांत हा प्राचीन लेणी समूह आहे. डोंगरकपारीत वसलेले हे गाव, बाजूला फणसांनी लगडलेली झाडे, नदीवरचा छोटासा पूल, नदीतील स्वच्छ आणि नितळ पाणी पाहत-पाहत आपण लेणींच्या दिशेने प्रवास करतो. पन्हाळे गावाच्या दक्षिणेकडील डोंगर-माथ्यावर ‘पन्हाळे’ नावाचा एक दुर्ग आहे. जवळच झोलाई देवी या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. शिलाहारांच्या बाराव्या शतकातील दोन ताम्रपटांत या ठिकाणाला ‘प्रणालक’ म्हणून संबोधित केल्याचे दिसते. सतराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात येथे नियुक्त केलेल्या एका काजीमुळे पन्हाळे नावाबरोबर ‘काजी’ हा शब्द जोडला गेला. पन्हाळे हे गाव दापोलीपासून २८ किमी वर आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावरून नानटे किंवा तेरे-वायंगणी गावातून पन्हाळे गावासाठी मार्ग आहे. तसेच दापोली-खेड रस्त्यावर असलेल्या वाकवली गावातूनसुद्धा पन्हाळे गावात येता येते. पण ह्या मार्गाने दापोली ते पन्हाळे अंतर आहे ३० किमी.

  
पन्हाळे-काजी येथील लेणीसमूह.

  अत्यंत निसर्गरम्य अशा सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी कोटजाई व धाकटी नदीच्या खोऱ्यात हे स्थळ असून साधारणतः इ. स. तिसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत समृद्ध अशा इतिहासाची साक्ष असणाऱ्या एकूण २९ लेणी येथे खोदण्यात आल्या आहेत. लेण्यांच्या समोरून वाहणारे नदीचे पाणी, काठावर असलेली आमराई आणि पूर्व-पश्चिम अशी २९ लेणी कोणालाही प्रथम दर्शनी भुरळ घालतात. येथील लेणी बौध्द आणि हिंदू प्रकारची आहेत. येथील लेण्यांमध्ये हीनयान, महायान, वज्रयान, शैव आणि नाथपंथीयांच्या स्थापत्यकला दिसून येतात. पहिली २८ लेणी एक ओळीत असून २९वे लेणे जे “गौर लेणे” नावाने ओळखले जाते ते थोडेसे दूर बागवाडीजवळ आहे. इसवी सनाच्या ३ शतकात चालू झालेले काम इसवी सनाच्या १४व्या शतकापर्यंत चालू होते. हीनयान पंथीयांनी हि लेणी खोदायचे काम सुरु केले आणि त्यानंतर महायान, वज्रयान हे बौध्द पंथ आणि त्यांच्यानंतर हिंदू धर्मातील शैव आणि नाथपंथीय येथे लेणी कोरायचे काम करीत होते. प्रत्येक पंथाने खोदकाम करीत असताना पूर्वीच्या लेण्यांमध्ये बदल थोडे घडवून आणले, तर काही लेणी नवीं खोदली. येथी लेण्यांमध्ये गौतम बुध्दाच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौध्द स्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचे कोरीव मंदिर, महाभारत आणि रामायणातील प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान आदी शिल्प ह्या लेण्यांमध्ये कोरलेली आहेत. २९व्या लेण्यात नाथपंथीयांचे ८५ शिल्पपट कोरलेले आहेत. या लेण्यात आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ इ. शिल्प सुध्दा कोरलेली आहेत. ​हीनयान (थेरवाद), वज्रयान, शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायाचा ठसा या लेण्यांवर पडलेला दिसून येतो.
     १९७०-७१ च्या दरम्यान पन्हाळे गावातील ‘केशवराव पांडुरंग जाधव’ नामक शेतकऱ्याला शेत नांगरताना एक दगडी पेटी फाळाला अडकली व त्या पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे आढळले. त्याने ते पत्रे गावातील लोकांना दाखवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतिहास संशोधनाची आवड असणाऱ्या दाभोळच्या अण्णा शिरगावकरांशी संपर्क केला. अण्णांनी हे पत्रे म्हणजे ताम्रपट असावे असे सांगितले. आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राध्यापिका ‘शोभनाताई गोखले’ यांच्या समोर सादर केले. शोभनाताईंनी हे पत्रे ताम्रपट असल्याचे निश्चित केले आणि त्या ताम्रपटांचा अभ्यास केला. अभ्यासातून ताम्रपट शिलाहार कालीन असल्याचे आढळले. वा. वि. मिराशी यांनी कॉर्पस इन्स्क्रिप्शन इंडिकॅरमच्या सहाव्या भागात हा ताम्रपट सांगोपांग चर्चेसह संपादित केला. या लेखावरून असे दिसून येते की, शिलाहार राजा प्रथम अपरादित्य (११२७–११४८) याने कदंबांना कोकणातून हुसकावून लावल्यावर आपल्या विक्रमादित्य या प्रिय पुत्रास प्रणालक या राजधानीच्या शहरी दक्षिण कोकणचा अधिपती बनवले.
        १९७२ साली भारतीय पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले आणि कोटजाई नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेला २८ लेण्यांचा समूह समोर आला. ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ म.न.देशपांडे (मधुसूदन नरहर देशपांडे) यांनी या लेण्यांचा अभ्यास करून The caves of Panhale-kaji  हा प्रबंध लिहिला. या प्रबंधाकरिता त्यांना १९८६ चे ‘एशियाटिक सोसायटी ऑफ वेस्ट बंगाल’ सर्वोत्कृष्ट कार्यपदक मिळाले. पन्हाळेकाजीचा विषय घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने केली. छापिल माध्यमांमधून त्यांच्या मुलाखती झाल्या. हायडेलबर्ग (प.जर्मनी) येथे झालेल्या ‘महाराष्ट्र संस्कृती व समाज’ या अंतरराष्ट्रीय सम्मेलनात देखील म.न.नी पन्हाळेकाजीचा उल्लेख केला होता.
     शिलाहार काळातील दोन शिलालेखांमध्ये या स्थानाचा उल्लेख आहे (इ.स. १२ वे शतक ).यावरुन हे ठिकाण शिलाहार काळात महत्वाचे असावे असे दिसते. या लेण्यांना लयनस्थापत्याच्या इतिहासात महत्व आहे.याचे कारण म्हणजे या लेण्यात एकेकाळी वज्रयान संप्रदाय प्रचलित होता.यापुर्वी उपलब्ध पुराव्यानुसार वेरुळ व कान्हेरी येथे वज्रयान संप्रदाय प्रचलित होता हे संशोधकाना माहिती होते. एका शिलालेखामध्ये शिलाहार कपर्दिच्या राजवटीत आणि राष्ट्रकुट नृपती पहिला अमोघवर्ष याच्या काळात इ.स.च्या नवव्या शतकाच्या मध्यात ( शके ७७५) गौडदेशीय गोमिन अविघ्नाकराने कृष्णगिरी येथे ध्यानधारणेसाठी लेणे खोदवले असे म्हणले आहे. या शिलालेखावरुन कोकणातील बौध्दांचा बंगालमधील बौध्दांशी निकटतम संपर्क होता.त्यामुळेच पुर्व भारतातील वज्रयान संप्रदाय महाराष्ट्रात विशेषतः कोकणात पोहचला असे मानले जाते.पन्हाळेकाजी इथे उत्खनन करताना अक्षोभ्याच्या पाच सुट्या मुर्ती, दोन काम्य किंवा अर्पित मुर्ती, महाचंडरोषण व सिध्दैकवीर यांची प्रत्येकी एकेक मुर्ती सापडली.यावरुन याठिकाणी वज्रयान पंथाची उपासना होत असावी या निष्कर्षाप्रत श्री.म.न.देशपांडे आले.मुळ बौध्द धर्मातून इ.स. चौथ्या शतकात असंग याने मैत्रेय याच्या कृपेने काहीजणांना वज्रयान पंथाची दीक्षा दिली.
वज्रयान पंथाविषयी:
    पन्हाळेकाजी लेण्यांची माहिती घेण्यापुर्वी थोडे वज्रयान पंथीयांविषयी जाणून घेउया.भगवान बुध्दानी आपले तत्वज्ञान सोप्या शब्दात आपल्या अनुयांयापर्यंत पोहचवले.त्यांनी पुढे संघाची स्थापना केली.यानंतर बौध्द धर्माची सुरवात झाली.सुरवातीच्या काळात स्तुप स्थापन करुन बुध्दांची आराधना सुरु झाली.यात मुळ तत्वज्ञानाला महत्व होते.या पंथाला थेरवादी असे म्हणले जाउ लागले.पुढे मात्र दगोबाएवजी बुध्दांची मुर्ती कोरली जाउन त्याची पुजा करण्याची कल्पना पुढे आले.या पंथीयाना महायान पंथीय म्हणले जाउ लागले.आपण महायान त्यामुळे दगोबाला पुजणारे हीनयान म्हणून थेरवादींना हीनयान म्हणले जाउ लागले.याशिवाय तिसरा पंथ वज्रयान.हा मात्र महाराष्ट्रात फार रुजला नाही.
     बंगाल मधील पाल राजांच्या राजवटीत (इ.स. ८ ते १२ वे शतक ) हा संप्रदाय चांगला फोफावला. या संप्रदायाच्या आचरणामध्ये काही धर्ममतांचा,विधीचा,यंत्रपुजेचा म्हणजे काही तांत्रिक आकृत्यांच्या पुजेचा आणि काही मंत्रांचा समावेश होतो. या बाबींनी महायान पंथीयांच्या आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरुपात बदल घडवून आणला. या पंथीयांचा देव म्हणजे अक्षोभ्य.हा अक्षोभ्य ज्या आसनावर बसला असतो त्यावर वज्र कोरले असते.त्याच्यावरुनच या पंथाला वज्रयान हे नाव पडले. वज्रयान पंथीयांसाठी अक्षोभ्याच्या कुलातील आणखी दोन दैवते म्हणजे महाचंडरोषण आणि सिध्दैकवीर. विशेष म्हणजे या मुर्ती पन्हाळेकाजी सोडल्यास महाराष्ट्रातील अन्य लेण्यात आढळत नाहीत.यावरुन हा पंथ फक्त इथेच अस्तित्वात होता असे दिसते.या ठिकाणी असलेल्या महचंडरोषणाची अशीच मुर्ती ओरिसातील काम्य स्तुपावर असलेल्या मुर्तीशी साधर्म्य आहे.
   इ. स. सु. तिसऱ्या शतकात हीनयान पंथाच्या भिक्षूंसाठी पन्हाळे-काजी येथे लेणी तयार केली गेली. या लेणी-समूहातील लेणी क्र. ४, ५, ६, ७, ८ व ९ मूलतः सु. तिसऱ्या शतकात खोदल्या गेल्या. लेणी क्र. २, १०, ११, १२, १३ व १८ या साधारणतः चौथ्या-पाचव्या शतकात खोदल्या गेल्या. त्यानंतर साधारणतः दहाव्या शतकात वरील सर्व लेण्यांमध्ये वज्रयानी पंथीयांनी बरेचसे फेरफार केले.
    वज्रयानी पंथीयांनी दहाव्या शतकात लेणी क्र. १, ३, १४, १५, १६, १७, १९, २१ व २७ या नव्याने खोदल्या असल्याचे दिसते. पुढे तेराव्या शतकात यातील लेणी क्र. १४, १५, १७, १९ व २१ ब्राह्मण (हिंदू) धर्माच्या प्रभावाखाली आल्या. यातील लेणे क्र. १४ नाथ संप्रदायाच्या ताब्यात आले. ब्राह्मण धर्मीयांसाठी बाराव्या-तेराव्या शतकात लेणी क्र. २०, २२, २३, २४, २५, २६ व २८ या नव्याने खोदल्याचे दिसून येते. यांपैकी लेणे क्र. २२ नंतर चौदाव्या शतकात नाथ संप्रदायाच्या प्रभावाखाली आले, तर लेणे क्र. २९ नाथ-संप्रदायासाठी चौदाव्या शतकात खोदण्यात आले.
      लेणी क्र. ४, ५ व ६ मध्ये स्तूप स्थापन केल्याचे आढळून येते. लेणे क्र. ५ मधील पाठीमागच्या भिंतीत अर्धोत्कीर्ण स्तूप आहे. लेणी क्र. ७, ८ व ९ ही मुळात भिक्षुगृहे (विहार) होती. यांतील काही लेण्यांसमोर नंतर वृत्तचितीच्या आकारातील स्तूपही स्थापिले गेले.
       महायान पंथीयांसाठी काही बदल केलेले दिसत नाहीत. परंतु आठव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत वज्रयान पंथीयांचे वास्तव्य येथे असावे, असे दिसते. याच काळात विशेषतः दहाव्या शतकात येथील लेण्यांत गुप्त तांत्रिक पुजाविधीस उपयुक्त असे फेरफार करून नवीन तांत्रिक देवतांच्या मूर्तींची स्थापना केल्याचे दिसून येते. मुळातील भिक्षुगृहांच्या पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तींची स्थापना केली होती. लेणीत दिसणाऱ्या अष्टकोनी स्तंभात बदल करण्यात आले व दर्शनी स्तंभांच्या स्तंभशीर्षात नागबंध जोडले गेले. मंडपात प्रवेश करण्यासाठी असलेल्या द्वारांवर अलंकृत ललाटबिंब कोरण्यात आली. काही वाढीव खोल्याही नव्याने खोदण्यात आल्या. ईशान्य भारतात लोकप्रिय असणाऱ्या अक्षोभ्य, सिद्धैकवीर या तांत्रिक देवतांची पूजा पन्हाळे-काजी येथे केली जाऊ लागली.
  लेणे क्र. १० वज्रयान पंथाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे आहे. येथून मिळालेल्या ‘महाचंडरोषण’ या वज्रयानी देवतेच्या दुर्मीळ मूर्तीमुळे येथील भिक्षूंचा संबंध बंगाल व ओडिशा येथील तांत्रिक केंद्रांशी आला असावा, असे दिसते.
    लेणे क्र. १४ मध्ये नाथ संप्रदायाशी संबंधित शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस मिळून एकूण १२ शिल्पे आहेत. यातील चौरंगीनाथ तसेच कानिफनाथ व बहुडी योगिनी यांची शिल्पे लगेच ओळखू येतात. गर्भगृहातील शिल्पांपैकी आदिनाथ व मत्स्येंद्रनाथांची शिल्पे ओळखायला सोपी आहेत. या लेण्यात गोरक्षनाथांचे एक खंडित व सुटे शिल्पही मिळालेले आहे. लेणे क्र. १५ मध्ये गणपतीची सुटी मूर्ती स्थापून हे लेणे गाणपत्य संप्रदायाशी जोडले गेले. लेणे क्र. १६ च्या समोर शिलाहारकालीन छोटेसे देवालय असल्याचे दिसते.
    लेणी क्र. १८ ते २३ हा लेण्यांचा समूह आहे. यातील १८ वे लेणे वज्रयान पंथी आहे. लेणी क्र. १९ ते २३ मध्ये साधारणतः बाराव्या शतकात भरपूर कामे झाली. अकराव्या शतकात शिलाहार शैलीचे एकाश्म देवालय म्हणून १९ क्रमांकाचे लेणे साकारले गेले. या मंदिराच्या छतावर रामायण, महाभारत व कृष्ण-लीलेशी संबंधित शिल्पपट कोरण्यात आले. लेणे क्र. २१ मध्ये असलेल्या गणपतीच्या शिल्पावरून या लेण्याला ‘गणेश लेणे’ म्हणून ओळखले जाते. लेणे क्र. २२ चौदाव्या शतकात नाथ-योग्यांनी वापरायला सुरुवात केले. या लेण्याच्या गर्भगृहात पद्मासनात बसलेली नाथ-योग्याची मूर्ती कोरण्यात आली आहे. लेणी क्र. २४ ते २८ समूहातील २४ व्या लेण्यात कोणतीही मूर्ती नाही. २५ क्रमांकाचे लेणे अपूर्ण आहे. लेणी क्र. २६, २७ व २८ आकाराने लहान असून यांत वैशिष्ट्यपूर्ण असे काही नाही.
    लेणे क्र. २९ हे मुख्य लेणी समूहापासून साधारणतः दीड किमी. अंतरावर आहे. हे लेणे संपूर्णतः नाथ संप्रदायाशी निगडित असून याची रचना इतर लेण्यांपेक्षा निराळी आहे. येथील मुख्य गर्भगृहातील शिल्पांमध्ये आदिनाथ-मत्स्येंद्र-गिरीजा, त्रिपुरसुंदरी व ८४ सिद्ध, तसेच प्रांगणात समोर लक्ष्मी, गणेश व सरस्वती यांची शिल्पे आहेत.
   एकंदरीत पन्हाळे-काजी हे ठिकाण वज्रयान पंथाचे प्रमुख ठाणे होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाच्या दृष्टीनेही याचे अत्यंत महत्त्व आहे. येथील लेणी कला व स्थापत्य या व्यतिरिक्त धार्मिक परंपरेत झालेल्या बदलांच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. पन्हाळे-काजी येथील लेण्यांच्या अभ्यासातून हीनयान बौद्ध पंथाचे तांत्रिक वज्रयान पंथात कसे रूपांतरण झाले व पुढे हे ठिकाण शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायापर्यंत कसे विकसित होत गेले, हेही समजते.







ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ  म.न.देशपांडे पन्हाळेकाजी संदर्भात म्हणतात की…. सातवाहन राजवंशात कोकणामध्ये ‘हीनयान’ बौद्ध पंथाचा प्रसार झाला. कोकणामध्ये अनेक विहार-संघाराम, चैत्यगृहे स्थापली गेली. पन्हाळे येथील संघाराम खेडमधील भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली स्थापले गेले असावे आणि याची प्राथमिक सुरुवात लहान प्रमाणात झाली असावी असे वाटते. कारण खेडमध्ये स्तूपयुक्त विहार व काही पूर्णअपूर्ण लेणी आहेत. आणि खेड या व्यापारी स्थळमार्गापासून पन्हाळेकाजी जवळच्या टप्प्यात येते. कोटजाई आणि दाभोळ बंदरामार्फत येथे व्यापारी मचव्यांची ये-जा असावी. २८ लेण्यांपैकी ४,५,६ व ७,८,९ क्रमांकाच्या लेण्या मिळून जो गट तयार होतो. तो या समूहातील सर्वात जुना गाभा आहे. ७,८,९ हा वेगळा गट असला तरी तो काळाच्या दृष्टीने ४,५,६ च्या जवळचा आहे. ४,५,६ या गटात ४ व ५ क्रमांकाच्या गुहा लहान भिक्षुगृहाप्रमाणे आहेत. ५ क्रमांकाच्या लेणीमध्ये स्तूप संस्थापना दिसते. हा स्तूप अर्धोत्कीर्ण असून पाठीमागचे भिंतीत, तेथे नंतर खोदल्या गेलेल्या गर्भगृहाच्या द्वाराच्या उजव्या बाजूस आहे. अश्याच तऱ्हेचा स्तूप चौल येथील हिंगळाजदेवी लेणीसमूहात आहे. या दोन्ही स्तूपांचा काळ साधारणतः दुसरे-तिसरे शतक आहे. यावरून असे अनुमान करता येते की पन्हाळेकाजी येथील बौद्ध संघारामाची सुरुवात २–३ शतकात झाली. सहा क्रमांकाचे लेणे विहार असल्याचे दिसते. या लेणीच्या पडवीत पश्चिम बाजूच्या भिंतीवर एक ब्राह्मी लेख होता. पण उत्तर कालात तो छिन्नीने इतका खरडून टाकला आहे की, त्यामधील दोनचार अक्षरेच संदर्भाशिवाय दिसतात. त्या अक्षरांवरून (विशेषतः म च्या अक्षर वाटिकेवरून) हा लेख दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील असावा, असा अंदाज करता येतो. सहाव्या – सातव्या शतकात महाराष्ट्रात चालुक्यांचा प्रभाव वाढू लागला आणि महाराष्ट्रातील बौद्ध संघारामाचे महत्व कमी होऊ लागले. वेरूळ व कान्हेरी अशा काही स्थानांव्यतिरीक्त नवीन बौद्ध धर्मीय गुहा, स्मारके खोदल्याचे दिसत नाही. चालुक्य हे शैवपंथी होते. आठव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांचा प्रभाव कमी झाला आणि बौद्ध धर्मातील तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. हे वर्चस्व साधारणतः ११ व्या शतकापर्यंत होते. त्यामुळे हीनयान पंथीय लेण्यांच्या स्थापत्य वैशिष्ट्यात वज्रयान पंथीयांकडून फेरबदल झाले. सहाव्या लेणीतील गर्भगृह वाढून भिक्षुगृहाचे रुपांतर अक्षोभ्य मंदिरात केलेले आढळते. गट १,२,३ या गटातील २ क्रमांकाची लेणी विहार म्हणून खोदली गेली होती व जवळपास तिची योजना क्र. सहाच्या लेण्याप्रमाणेच आहे. या लेणीतील मंडपाचे छतावर मध्यभागी अर्धोत्कीर्ण व एकमेकास काटकोनाने छेदणाऱ्या उन्नत लगींनी १६ चौकोन केले आहेत, अशा तऱ्हेने छतावर लाकडी तुळया व लगी यांचा वापर दाखविण्याची प्रथा ही जुनीच आहे. या स्तंभ विरहीत मंडपात भिंतीलगत कठडा (Rock Bench) आहे. या सर्व लक्षणांवरून ती लेणी मुळात दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील आहे; पण १० व्या शतकात तिच्यात बदल झाले आहेत, हे कळून येते. १० व्या शतकातील बदलानुसार दर्शनी स्तंभ शिर्षात नागबंध आला. मंडपाच्या मागील भिंतीत गर्भगृहाच्या दक्षिण बाजूस सात उभे मानुषी बुद्ध कोरले गेले. या लेणीच्या मंडपाचे प्रवेशद्वार थोडेफार अलंकृत शाखायुक्त होते. पण नंतर ते अलंकरण खोडून काढून साधे केले. यावरून असे लक्षात येते की, तांत्रिक वज्रयान पंथीयांनी ही लेणी आपलीशी केली होती. गट ७, ८, ९ ७,८,९ हा गट ६ क्रमांकाला जोडूनच आहे. व येथेही वज्रयान पंथीयांनी केलेले बदल दिसून येतात. ७,८,९ क्रमांकाची लेणी ही मुळातच भिक्षुगृहे होती. पण पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तीची स्थापना झाली. ७ क्रमांकाच्या लेण्याखाली खालच्या थरात एक क्षतिग्रस्त व अपूर्ण लेणे आहे. ७ क्रमांकाच्या उमऱ्यावर मधील पुढे आलेला भाग सोडून दोन्ही बाजूस पुष्पयुक्त हिराकृति आहेत. लेणी क्र. आठ मध्ये गर्भगृहात शिरविरहित अक्षोभ्याची मूर्ती आहे. ५ आणि ६ क्रमांकाच्या लेणीच्या छतावर स्तूप बसविलेला होता. अशा काही खुणा आढळतात. व तेथेच पडलेले काही स्तूप दिसून येतात. त्यावरून ५, ६ बरोबर ७ क्रमांक लेणीवर देखील स्तूप असावा, असे वाटते. गट १०, ११, १२ व १३ या गटातील १२ क्रमांकाच्या लेण्याचे योजनाचित्र जवळपास २ व ६ प्रमाणेच आहे. मुळतः विहार म्हणून खोदल्या गेलेल्या या स्तंभांना चौकोनी अधिष्ठान दिले आहे. पण तरीसुद्धा ते पँरापेट (कठडा) पासून अभिन्न आहेत. मंडपाचे पाठीमागचे भिंतीत मुळात असलेल्या तीन भिक्षूगृहांपैकी मधल्या भिक्षुगृहाचा उपयोग अक्षोभ्याच्या मूर्ती स्थापनेसाठी झाला असावा. तांत्रिक वज्रयान पंथाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची लेणी म्हणजे क्रमांक दहाची लेणी. कारण या लेणीत हत्ती व सिंह असलेल्या सप्तरत अधिष्ठानावर स्थित असलेली महाचंडरोषणाची मूर्ती आढळते. आणि तिच्या दगडात कोरलेल्या प्रतिमा अगदीच विरळ्या असून १९८१ पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात दोनच मूर्ती आढळल्या. एक पन्हाळेकाजी येथे व दुसरी रत्नागिरी येथे. रत्नागिरी येथे डॉ. देवला मित्रांना ही मूर्ती एका स्तूपावर कोरलेली आढळली. पन्हाळेकाजी येथील महाचंडरोषणाची प्रतिमा सुमारे दहाव्या शतकातील असावी व ती उत्तरकालीन चालुक्य कलेशी मेळ खाते. अक्षोभ्याच्या मूर्तीही नवव्या-दहाव्या शतकातील असाव्यात असे त्यांच्या शैलीवरून वाटते व अशा चालुक्य उत्तर काळामध्ये वज्रयांनी बौद्ध धर्माच्या शाखा दक्षिण महाराष्ट्रात व कर्नाटकात होत्या याचा थोडाफार पुरावा मिळतो. गट १५, १६,१७,१८ १५ चे लेणे मूळ वज्र यान पंथी होते. पण मागाहून इथे गणपतीची सुटी मूर्ती दर्शनी भागातील कोनाड्यात ठेवून हे लेणे गाणपत्य पूजेसाठी वापरले जावू लागले. लेण्याच्या ललाट बिंबावर देखील गणेशमूर्ती कोरलेली आहे. १६ क्र. चे लेणेही मूळ वज्रयान पंथी. या लेण्याच्या जवळ एक बांधीव चौथरा दिसतो व शिलाहार काळ निदर्शक एक देवकोष्ठचा भाग सापडतो. यावरून असा अंदाज बांधता येतो की, येथे शिलाहार काळात एक छोटेसे देवालय असावे. १७ वे व १८ वे लेणे वज्रयान पंथीच आहे. गट १९, २०, २१, २२ व २३ १९ ते २३ हा गट शिलाहारांशी निगडीत आहे. शिलाहार काळात पन्हाळेकाजीत जे विशेष लक्षणीय काम झाले; ते केवळ या गटामधून दिसून येते. यातील १९ क्रमांकाच्या लेण्याची सुरुवात आधी झाली असली तरी ११ व्या शतकात शिलाहारशैलीचे एकाश्म देवालय म्हणून हे लेणे साकारले गेले. या देवळातील स्तंभ शिलाहारकालीन आणि गर्भगृह एकाश्म असून त्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली होती. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ आणि त्याच्या पाठीमागच्या भिंतीत दोन्ही बाजूस उत्तरामुख व अंतराळात समोरासमोर देवकोष्ठे आहेत. यावरून हे मंदिर पंचायतन म्हणून योजिले होते, असे दिसते. सभामंडपाच्या अंतराळाच्या व एकाश्म मंदिराच्या छतावर शिल्पे व उलट्या कमळाचे अलंकरण मध्यभागी असून बाजूच्या खणात रामायण व महाभारतातील प्रसंगाचे शिल्पपट कोरलेले आहेत. पूर्वेकडील खणात रामायण, पश्चिमेकडील खणात बाळकृष्णलीला व मधल्या खणात ( कमळाचे बाहेर ) पुन्हा कृष्णकथा कोरलेल्या आहेत. अंतराळाच्या बाजूस पहिला खण व व अंतराळ यामध्ये अधिष्ठान स्थापलेल्या शिवलिंगाची एक दंपती पूजा करीत असल्याचे एक दृश्य आहे. हे दृश्य मंदिर निर्माण करविणाऱ्या दानी दंपतीचे असावे. अंतराळाच्या पश्चिमेस छतावर आणखी ९ शिल्पे आहेत. २१ क्रमांकाच्या लेण्यात मुख मंडपाच्या बाजूच्या भिंतीत एक विशाल शिलाहारकालीन गणेशमूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीमुळे या लेण्यास गणेशलेणे म्हणतात. हे लेणे मुळात विहार म्हणून बांधले असावे आणि त्याचा वापर वज्रयान पंथीयांनी केला असावा. २२ क्रमांकाच्या लेण्यात मुखमंडपात बाजूच्या भिंतीत समोरासमोर गणेश व सरस्वतीच्या प्रतिमा आहेत तर गर्भगृहात सुमारे १४ व्या शतकामध्ये पद्मासनस्थ नाथयोग्याची मूर्ती कोरली आहे. २३ क्रमांकाचे लेणे मुळात विहार म्हणून खोदले गेले होते. १२ व्या शतकात त्याचे शिलाहार मंदिरात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात मूर्ती संस्थापना करण्याअगोदरच येथील शैवपंथाच्या वर्चस्वास ओहोटी लागली असावी. या लेण्यात विध्वंसाची चिन्हे दिसतात. पण हा विध्वंस बराच नंतर झालेला असावा. कदाचित दाभोळ येथे विजापूरच्या इब्राहिम आदिलखानाच्या कारकिर्दीत मशिदी बांधल्या गेल्या; तेव्हा झाला असावा. १४ व २९ गट १४ वे लेणे मुळात हीनयान बौद्ध धर्मियांनी भिक्षुगृह म्हणून खोदले असावे. पण मागाहून त्याचा वापर वज्रयान प्राबल्य संपल्यावर नाथ पंथीयांनी केला असे स्पष्ट दिसते. नाथ पंथीयांचे पन्हाळेकाजी येथे केंद्र साधारणतः तेराव्या चौदाव्या शतकात तयार झाले असावे. या लेण्याच्या प्रांगणात एका घडीव चौकोनी दगडावर सिद्ध पादुका कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराचे बाजूस सहा-सहा अशी एकूण बारा शिल्पे आहेत. त्यातील पहिल्या चौकोनात योग पट्टसहित अर्धमत्सेंद्रासनात छताचे खाली एक सिद्ध आहेत. त्यांचा उजवा हाथ समोरील चौकोनातील स्त्री काही वस्तू देत आहे; ती घेण्यासाठी उंच केलेला असून डावा हाथ त्यांनी कुबडीवर ठेवलेला आहे. हा प्रसंग कदलीवनात मत्सेन्द्रनाथांनी काही काळ तंत्रमार्गी योगिनींचे जाळ्यात शाक्त साधनेत घालवला त्यासंबंधीचा असावा, असा अंदाज व्यक्त करता येतो. आणि इतर कुठल्याही सिद्धाचे डोक्यावर छत नसताना फक्त याच सिधाच्या डोक्यावर आहे. याचा अर्थ ते नाथ पंथीयांचे प्रथम सिद्ध असावेत. उजव्या बाजूच्या वरच्या दोन प्रसंगात एकामध्ये एक स्त्री व दुसऱ्यात एक सिद्ध यांच्यातील संवाद चित्रित केला आहे. हा प्रसंग देखील मत्सेंद्रनाथांच्या जीवनावरील असावा, असा अंदाज दर्शवता येतो. डाव्या बाजूच्या दुसऱ्या पटात (मधल्या चौकोनात) ध्यानस्थ चौरंगी नाथांची मूर्ती असून त्यांचे तुटलेले हाथ पाय खांद्याजवळ आणि पाया जवळ वेगळे दाखवले आहेत. त्याच्या जवळची मूर्ती त्यांचे गुरुबंधू गोरखनाथ यांची असावी. उजव्या बाजूच्या दुसऱ्या पटात द्वाराजवळील चौकोनात एक योगी चिमट्याने एका तीन पाटाच्या आसावर ठेवलेल्या कुंडामधील वस्तू उचलीत आहे. नाथपंथीय साधू रसविदयेत प्रवीण होते, हे दर्शविण्यासाठी ही प्रतिमा कोरली असावी. तर त्या शेजारच्या चौकोनात कोणी एक व्यक्ती हातामध्ये काही सामग्री घेऊन रसप्रक्रियेत मग्न असलेल्या सिद्धाकडे जात आहे असे दर्शवले आहे. डाव्या बाजूच्या खालच्या दोन चौकोनात एका बसलेल्या सिद्धाची मूर्ती असून ते एक पेटी उघडीत अथवा बंद करीत आहेत. तर त्याच्या शेजारच्या कोनात डाव्या हातात पात्र व उजव्या हातात दंड किंवा पळी घेतलेला सिद्ध पुरुष धावण्याच्या किंवा चालण्याच्या क्रियेत आहे.तर उजव्या बाजूच्या दोन चौकोनात एक लगुड घेतलेले सिद्ध व दुसरे व्याख्यान मुद्रेतील सिद्ध दाखविले आहेत. या लेण्याच्या द्वारशाखेवर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आणि उंबरठ्याच्या मध्यभागी एक गोलाकार भाग आहे. २९ वे लेणे हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत. यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे. या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे. इतर चार भिंतींवर छोट्या छोट्या चौकोनात अनेक सिद्धांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. उजवीकडील व डावीकडून भिंतीत दोन मोठ्या कोनाड्यात दोन प्रमुख देवतांची स्थापना केली आहे. त्यापैकी उजवीकडून भिंतीत शरभ तंत्रामध्ये वर्णिलेल्या त्रिपूरसुंदरीचे ध्यान कोरलेले आहे. तिच्या चार हातांपैकी एका हातात बाण, दुसऱ्यात अंकुश, तिसऱ्यात इक्षुचाप, चौथ्यात पाश आहे. समोरच्या भिंतीत जटाधारी कानफाट्या नाथसिद्धाची व्याख्यान मुद्रेत बसलेली मूर्ती आहे. या लेण्यात दक्षिणेकडील भिंतीचे मागील बाजूस दरवाजाच्या पूर्वस छोट्या चौकोनात ९, पूर्वेकडील भिंतीत १९ व उत्तरेकडील भिंतीत २९ ,पश्चिमेकडील भिंतीत १९, व पुन्हा व दक्षिणेकडील भिंतीत दरवाजाच्या पश्चिमेस ९ अशी एकूण ८५ शिल्पे आहेत. ही सर्व शिल्पे बहुतेक नाथ योग्यांची आहेत. या शिल्पांतील बहुतेक सर्व सिद्ध व्याख्यान मुद्रेमध्ये, पद्मासनात, अर्धमत्सेंद्रासनात, तर क्वचित चालताना आहेत. लेण्यांच्या बाहेर उघड्या प्रांगणावर लाकडी मंडप घालण्याची योजना होती, असे भिंतीतील खाचांमुळे स्पष्ट होते. दाराबाहेर एक छोटासा कट्टा आहे. तर थोडे उत्तरेकडे वळल्यावर डाव्या बाजूस भैरव, हनुमान यांची कोनाड्यात कोरलेली शिल्पे आहेत.हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत. यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे. या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे. २४ ते २८ गट या गटातील लेणी आकाराने लहान असून यात वैशिष्टपूर्ण असे काहीच आढळत नाही. फक्त २५ क्रमांकाच्या लेण्याच्या प्रांगणात एक एकाश्म लिंगयुक्त मंदिर कोरले आहे. म.न.देशपांडे यांच्या अभ्यासानंतर २००४ साली पन्हाळेकाजीत आणखीन एक ताम्रपट सापडला. हा ताम्रपट त्याच गावातील ग.रा.जाधव यांच्या देवघरात पूजेला लावलेला होता. ठाण्याचे नाणे शास्त्राचे अभ्यासक आणि दक्षिण भारतीय परिषदेचे उपाध्यक्ष श्री. शशिकांत धोपाटे यांनी तो अभ्यासला व त्याचे वाचन करून भारतीय पुराभिलेख संस्थेला सादर केला. हा ताम्रपट शिलाहार राजवंशातील मल्लिकार्जुन राजा पन्हाळेदुर्ग येथे राज्य करीत होता; त्यावेळचा आहे. या ताम्रपटात शिलाहारांनी जैन मंदिराला ग्रामदान केल्याचा उल्लेख प्रथमच आढळला. त्याआधी सापडलेल्या ताम्रपटातून शिलाहारांनी शिवमंदिरे, देवी मंदिरे आणि बुद्ध विहारांना ग्रामदान केल्याचे उल्लेख आहेत. या ताम्रपटामुळे शिलाहारांच्या इतिहासात नवीन भर पडली. शिलाहार राजवंशातील सोळावा राजा अपरादित्य याचा मल्लिकार्जुन हा चौथा मुलगा होता. ( पहिला केशिदेव, दुसरा विक्रमादित्य, तिसरा हरिपालदेव व चौथा मल्लिकार्जुन ) हे चारही राजे सख्खे भाऊ होते. हे या ताम्रपटाद्वारे प्रथमच ज्ञात झाले. शिलाहारांची राजवट कोकणात दीर्घकाळ होती व या राजवंशाची राजधानी प्रणालक दुर्ग येथे होती. (प्रणालकदुर्ग-पन्हाळेदुर्ग- पन्हाळेकाजी काळानुसार झालेला अपभ्रंश.) शिलाहार हा महाराष्ट्रात राज्य करणारा एक प्रमुख राजवंश होता. पन्हाळेकाजीचे लेणे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, याकरता अनेकांकडून अथक प्रयत्न झाले. पण धार्मिक स्थित्यंतरे पाहणाऱ्या या लेण्यांना आजही म्हणावी तितकी प्रसिद्धी लाभलेली नाही. सध्या पर्यटन संख्या वाढते आहे, पण तरीही ती संख्या सुमार म्हणण्या इतपतच आहे. फक्त एक सुदैवाची बाब म्हणजे भारतीय पुरातत्त्व खात्याकडून या लेण्यांची उचित देखभाल होत आहे. 

म.न.देशपांडे यांच्या  अभ्यासानंतर २००४ साली  पन्हाळेकाजीत  आणखीन एक ताम्रपट सापडला. हा ताम्रपट त्याच गावातील ग.रा.जाधव यांच्या देवघरात पूजेला लावलेला होता. ठाण्याचे नाणे शास्त्राचे अभ्यासक आणि दक्षिण भारतीय परिषदेचे उपाध्यक्ष श्री. शशिकांत धोपाटे  यांनी तो अभ्यासला व त्याचे वाचन करून  भारतीय पुराभिलेख संस्थेला सादर केला. हा ताम्रपट शिलाहार राजवंशातील मल्लिकार्जुन राजा  पन्हाळेदुर्ग येथे राज्य करीत होता; त्यावेळचा आहे. या ताम्रपटात शिलाहारांनी जैन मंदिराला ग्रामदान केल्याचा उल्लेख प्रथमच आढळला. त्याआधी सापडलेल्या ताम्रपटातून शिलाहारांनी शिवमंदिरे, देवी मंदिरे आणि बुद्ध विहारांना ग्रामदान केल्याचे  उल्लेख आहेत. या ताम्रपटामुळे शिलाहारांच्या  इतिहासात नवीन भर पडली. शिलाहार  राजवंशातील सोळावा राजा अपरादित्य याचा  मल्लिकार्जुन  हा चौथा मुलगा होता. ( पहिला केशिदेव, दुसरा  विक्रमादित्य, तिसरा  हरिपालदेव व चौथा मल्लिकार्जुन ) हे चारही राजे सख्खे भाऊ होते. हे  या ताम्रपटाद्वारे  प्रथमच ज्ञात झाले.  शिलाहारांची राजवट कोकणात दीर्घकाळ होती व या राजवंशाची  राजधानी प्रणालक दुर्ग येथे होती. (प्रणालकदुर्ग-पन्हाळेदुर्ग- पन्हाळेकाजी काळानुसार झालेला अपभ्रंश.) शिलाहार हा महाराष्ट्रात राज्य करणारा एक प्रमुख राजवंश होता.

..देशपांडे पन्हाळेकाजी संदर्भात म्हणतात की….

सातवाहन  राजवंशात कोकणामध्ये ‘हीनयान’ बौद्ध पंथाचा प्रसार झाला. कोकणामध्ये अनेक विहार-संघाराम, चैत्यगृहे स्थापली गेली. पन्हाळे येथील संघाराम खेडमधील भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली स्थापले गेले असावे आणि याची  प्राथमिक सुरुवात लहान प्रमाणात झाली असावी असे वाटते. कारण खेडमध्ये स्तूपयुक्त विहार व काही पूर्णअपूर्ण लेणी आहेत. आणि खेड या व्यापारी स्थळमार्गापासून पन्हाळेकाजी जवळच्या टप्प्यात येते. कोटजाई आणि दाभोळ बंदरामार्फत येथे व्यापारी मचव्यांची ये-जा असावी. २८ लेण्यांपैकी ४,५,६ व ७,८,९ क्रमांकाच्या लेण्या मिळून जो गट तयार होतो. तो या समूहातील सर्वात जुना गाभा आहे. ७,८,९ हा वेगळा गट असला तरी तो काळाच्या दृष्टीने ४,५,६ च्या जवळचा आहे.



४,५,६ या गटात ४ व ५ क्रमांकाच्या गुहा लहान भिक्षुगृहाप्रमाणे आहेत. ५ क्रमांकाच्या लेणीमध्ये स्तूप संस्थापना दिसते. हा स्तूप अर्धोत्कीर्ण असून पाठीमागचे भिंतीत, तेथे नंतर खोदल्या गेलेल्या गर्भगृहाच्या द्वाराच्या उजव्या बाजूस आहे. अश्याच तऱ्हेचा स्तूप चौल येथील हिंगळाजदेवी लेणीसमूहात आहे. या दोन्ही स्तूपांचा काळ साधारणतः दुसरे-तिसरे शतक आहे. यावरून असे अनुमान करता येते की पन्हाळेकाजी येथील बौद्ध संघारामाची सुरुवात २–३ शतकात झाली. सहा क्रमांकाचे लेणे विहार असल्याचे दिसते. या लेणीच्या पडवीत पश्चिम बाजूच्या भिंतीवर एक ब्राह्मी लेख होता. पण उत्तर कालात तो छिन्नीने इतका खरडून टाकला आहे की, त्यामधील दोनचार अक्षरेच संदर्भाशिवाय दिसतात. त्या अक्षरांवरून (विशेषतः म च्या अक्षर वाटिकेवरून)  हा लेख दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील असावा, असा अंदाज करता येतो.

सहाव्या – सातव्या शतकात महाराष्ट्रात चालुक्यांचा प्रभाव वाढू लागला आणि महाराष्ट्रातील बौद्ध संघारामाचे महत्व कमी होऊ लागले. वेरूळ व कान्हेरी अशा काही स्थानांव्यतिरीक्त नवीन बौद्ध धर्मीय गुहा, स्मारके खोदल्याचे दिसत नाही. चालुक्य हे शैवपंथी होते. आठव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांचा प्रभाव कमी झाला आणि बौद्ध धर्मातील तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. हे वर्चस्व साधारणतः ११ व्या शतकापर्यंत होते. त्यामुळे हीनयान पंथीय लेण्यांच्या स्थापत्य वैशिष्ट्यात वज्रयान पंथीयांकडून फेरबदल झाले. सहाव्या लेणीतील गर्भगृह वाढून भिक्षुगृहाचे रुपांतर अक्षोभ्य मंदिरात केलेले आढळते.

गट १,२,३

या गटातील २ क्रमांकाची लेणी विहार म्हणून खोदली गेली होती व जवळपास तिची योजना क्र. सहाच्या लेण्याप्रमाणेच आहे. या लेणीतील मंडपाचे छतावर मध्यभागी अर्धोत्कीर्ण व एकमेकास काटकोनाने छेदणाऱ्या उन्नत लगींनी १६ चौकोन केले आहेत, अशा तऱ्हेने  छतावर लाकडी तुळया व लगी यांचा वापर दाखविण्याची प्रथा ही जुनीच आहे. या स्तंभ विरहीत मंडपात भिंतीलगत कठडा (Rock Bench) आहे. या सर्व लक्षणांवरून ती लेणी मुळात दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील आहे; पण १० व्या शतकात तिच्यात बदल झाले आहेत, हे कळून येते. १० व्या शतकातील बदलानुसार दर्शनी स्तंभ शिर्षात नागबंध आला. मंडपाच्या मागील भिंतीत गर्भगृहाच्या दक्षिण बाजूस सात उभे मानुषी बुद्ध कोरले गेले. या लेणीच्या मंडपाचे प्रवेशद्वार थोडेफार अलंकृत शाखायुक्त होते. पण नंतर ते अलंकरण खोडून काढून साधे केले. यावरून असे लक्षात येते की, तांत्रिक वज्रयान पंथीयांनी ही लेणी आपलीशी केली होती.

गट ७, ८, ९

७,८,९ हा गट ६ क्रमांकाला जोडूनच आहे. व येथेही वज्रयान पंथीयांनी केलेले बदल दिसून येतात. ७,८,९ क्रमांकाची लेणी ही मुळातच भिक्षुगृहे होती. पण पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तीची स्थापना झाली. ७ क्रमांकाच्या लेण्याखाली खालच्या थरात एक क्षतिग्रस्त व अपूर्ण लेणे आहे. ७ क्रमांकाच्या उमऱ्यावर मधील पुढे आलेला भाग सोडून दोन्ही बाजूस पुष्पयुक्त हिराकृति आहेत. लेणी क्र. आठ मध्ये गर्भगृहात शिरविरहित अक्षोभ्याची मूर्ती आहे. ५ आणि ६ क्रमांकाच्या लेणीच्या छतावर  स्तूप बसविलेला होता.  अशा काही खुणा आढळतात. व तेथेच पडलेले काही स्तूप दिसून येतात. त्यावरून ५, ६ बरोबर ७ क्रमांक लेणीवर देखील स्तूप असावा, असे वाटते.




गट १०, ११, १२ व १३

या गटातील १२  क्रमांकाच्या  लेण्याचे योजनाचित्र जवळपास २ व ६ प्रमाणेच आहे. मुळतः विहार म्हणून खोदल्या गेलेल्या या स्तंभांना चौकोनी अधिष्ठान दिले आहे. पण तरीसुद्धा ते  पँरापेट (कठडा)  पासून अभिन्न आहेत. मंडपाचे  पाठीमागचे भिंतीत मुळात असलेल्या तीन भिक्षूगृहांपैकी मधल्या भिक्षुगृहाचा उपयोग अक्षोभ्याच्या मूर्ती स्थापनेसाठी झाला असावा. तांत्रिक वज्रयान पंथाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची लेणी म्हणजे क्रमांक दहाची लेणी. कारण या लेणीत हत्ती व सिंह असलेल्या सप्तरत अधिष्ठानावर स्थित असलेली महाचंडरोषणाची मूर्ती आढळते. आणि तिच्या दगडात कोरलेल्या प्रतिमा अगदीच  विरळ्या असून १९८१ पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात दोनच मूर्ती आढळल्या. एक पन्हाळेकाजी येथे व दुसरी रत्नागिरी येथे. रत्नागिरी येथे डॉ. देवला मित्रांना ही मूर्ती एका स्तूपावर कोरलेली आढळली. पन्हाळेकाजी येथील महाचंडरोषणाची  प्रतिमा सुमारे दहाव्या शतकातील असावी व ती उत्तरकालीन चालुक्य कलेशी मेळ खाते. अक्षोभ्याच्या  मूर्तीही नवव्या-दहाव्या शतकातील  असाव्यात असे त्यांच्या शैलीवरून वाटते व अशा चालुक्य उत्तर काळामध्ये वज्रयांनी  बौद्ध धर्माच्या  शाखा दक्षिण महाराष्ट्रात व कर्नाटकात होत्या याचा थोडाफार पुरावा मिळतो.

गट १५, १६,१७,१८

१५ चे लेणे मूळ वज्र यान पंथी होते. पण मागाहून इथे गणपतीची सुटी मूर्ती दर्शनी भागातील कोनाड्यात ठेवून हे लेणे गाणपत्य पूजेसाठी वापरले जावू लागले. लेण्याच्या ललाट बिंबावर देखील गणेशमूर्ती कोरलेली आहे.




१६ क्र. चे लेणेही मूळ वज्रयान पंथी. या लेण्याच्या जवळ एक बांधीव चौथरा दिसतो व शिलाहार काळ निदर्शक एक देवकोष्ठचा भाग सापडतो. यावरून असा अंदाज बांधता येतो की, येथे शिलाहार काळात एक छोटेसे देवालय असावे.

१७ वे व १८ वे लेणे वज्रयान पंथीच आहे.

गट १९, २०, २१, २२ व २३

१९ ते २३ हा गट शिलाहारांशी निगडीत आहे. शिलाहार काळात पन्हाळेकाजीत जे विशेष लक्षणीय काम झाले; ते केवळ या गटामधून दिसून येते. यातील १९ क्रमांकाच्या लेण्याची सुरुवात आधी झाली असली तरी ११ व्या शतकात शिलाहारशैलीचे एकाश्म देवालय म्हणून हे लेणे साकारले गेले. या देवळातील स्तंभ शिलाहारकालीन आणि गर्भगृह एकाश्म असून त्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली होती. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ आणि त्याच्या पाठीमागच्या भिंतीत दोन्ही बाजूस उत्तरामुख व अंतराळात समोरासमोर देवकोष्ठे आहेत. यावरून हे मंदिर पंचायतन म्हणून योजिले होते, असे दिसते. 







सभामंडपाच्या अंतराळाच्या व एकाश्म मंदिराच्या छतावर शिल्पे व उलट्या कमळाचे अलंकरण मध्यभागी असून बाजूच्या खणात रामायण व महाभारतातील प्रसंगाचे शिल्पपट कोरलेले आहेत. पूर्वेकडील खणात रामायण, पश्चिमेकडील खणात बाळकृष्णलीला व मधल्या खणात ( कमळाचे बाहेर ) पुन्हा कृष्णकथा कोरलेल्या आहेत. अंतराळाच्या बाजूस पहिला खण व व अंतराळ यामध्ये अधिष्ठान स्थापलेल्या शिवलिंगाची एक दंपती पूजा करीत असल्याचे एक दृश्य आहे. हे दृश्य मंदिर निर्माण करविणाऱ्या दानी दंपतीचे असावे. अंतराळाच्या पश्चिमेस छतावर आणखी ९ शिल्पे आहेत.

२१ क्रमांकाच्या लेण्यात मुख मंडपाच्या बाजूच्या भिंतीत एक विशाल शिलाहारकालीन गणेशमूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीमुळे या लेण्यास गणेशलेणे म्हणतात. हे लेणे मुळात विहार म्हणून बांधले असावे आणि त्याचा वापर वज्रयान पंथीयांनी केला असावा.

२२ क्रमांकाच्या लेण्यात मुखमंडपात बाजूच्या भिंतीत समोरासमोर गणेश व सरस्वतीच्या प्रतिमा आहेत तर गर्भगृहात सुमारे १४ व्या शतकामध्ये पद्मासनस्थ नाथयोग्याची मूर्ती कोरली आहे.

२३ क्रमांकाचे लेणे मुळात विहार म्हणून खोदले गेले होते. १२ व्या शतकात त्याचे शिलाहार मंदिरात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात मूर्ती संस्थापना करण्याअगोदरच येथील शैवपंथाच्या वर्चस्वास ओहोटी लागली असावी. या लेण्यात विध्वंसाची चिन्हे दिसतात. पण हा विध्वंस बराच नंतर झालेला असावा. कदाचित दाभोळ येथे विजापूरच्या इब्राहिम आदिलखानाच्या कारकिर्दीत मशिदी बांधल्या गेल्या; तेव्हा झाला असावा.

१४ व २९ गट

१४ वे लेणे मुळात हीनयान बौद्ध धर्मियांनी भिक्षुगृह म्हणून खोदले असावे. पण मागाहून त्याचा वापर वज्रयान प्राबल्य संपल्यावर नाथ पंथीयांनी केला असे स्पष्ट दिसते. नाथ पंथीयांचे पन्हाळेकाजी येथे केंद्र साधारणतः तेराव्या चौदाव्या शतकात तयार झाले असावे. या लेण्याच्या प्रांगणात एका घडीव चौकोनी दगडावर सिद्ध पादुका कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराचे बाजूस सहा-सहा अशी एकूण बारा शिल्पे आहेत. त्यातील पहिल्या चौकोनात योग पट्टसहित अर्धमत्सेंद्रासनात छताचे खाली एक सिद्ध आहेत. त्यांचा उजवा हाथ समोरील चौकोनातील स्त्री काही वस्तू देत आहे; ती घेण्यासाठी उंच केलेला असून डावा हाथ त्यांनी कुबडीवर ठेवलेला आहे. हा प्रसंग  कदलीवनात मत्सेन्द्रनाथांनी काही काळ तंत्रमार्गी योगिनींचे जाळ्यात शाक्त साधनेत घालवला त्यासंबंधीचा असावा, असा अंदाज व्यक्त करता येतो. आणि इतर कुठल्याही सिद्धाचे डोक्यावर छत नसताना फक्त याच सिधाच्या डोक्यावर आहे. याचा अर्थ ते नाथ पंथीयांचे प्रथम सिद्ध असावेत. उजव्या बाजूच्या वरच्या दोन प्रसंगात एकामध्ये एक स्त्री व दुसऱ्यात एक सिद्ध यांच्यातील संवाद चित्रित केला आहे. हा प्रसंग देखील मत्सेंद्रनाथांच्या जीवनावरील असावा, असा अंदाज दर्शवता येतो.






डाव्या बाजूच्या दुसऱ्या पटात (मधल्या चौकोनात) ध्यानस्थ चौरंगी नाथांची मूर्ती असून त्यांचे तुटलेले हाथ पाय खांद्याजवळ आणि पाया जवळ वेगळे दाखवले आहेत. त्याच्या जवळची मूर्ती त्यांचे गुरुबंधू गोरखनाथ यांची असावी.

उजव्या बाजूच्या दुसऱ्या पटात द्वाराजवळील चौकोनात एक योगी चिमट्याने एका तीन पाटाच्या आसावर ठेवलेल्या कुंडामधील वस्तू उचलीत आहे. नाथपंथीय साधू रसविदयेत प्रवीण होते, हे दर्शविण्यासाठी ही प्रतिमा कोरली असावी. तर त्या शेजारच्या चौकोनात कोणी एक व्यक्ती हातामध्ये काही सामग्री घेऊन रसप्रक्रियेत मग्न असलेल्या सिद्धाकडे जात आहे असे दर्शवले आहे. डाव्या बाजूच्या खालच्या दोन चौकोनात एका बसलेल्या सिद्धाची मूर्ती असून ते एक पेटी उघडीत अथवा बंद करीत आहेत. तर त्याच्या शेजारच्या कोनात डाव्या हातात पात्र व उजव्या हातात दंड किंवा पळी घेतलेला सिद्ध पुरुष धावण्याच्या किंवा चालण्याच्या क्रियेत आहे.तर उजव्या बाजूच्या दोन चौकोनात एक लगुड घेतलेले सिद्ध व दुसरे व्याख्यान मुद्रेतील सिद्ध दाखविले आहेत. या लेण्याच्या द्वारशाखेवर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आणि उंबरठ्याच्या मध्यभागी एक गोलाकार भाग आहे.

२९ वे लेणे

हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत. यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे. या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत   चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे.





 


Read more at: https://talukadapoli.com/places/panhale-kazi-caves-research/

 इतर चार भिंतींवर छोट्या छोट्या चौकोनात अनेक सिद्धांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. उजवीकडील व डावीकडून भिंतीत दोन  मोठ्या कोनाड्यात दोन प्रमुख देवतांची स्थापना केली आहे. त्यापैकी उजवीकडून भिंतीत शरभ तंत्रामध्ये वर्णिलेल्या त्रिपूरसुंदरीचे ध्यान कोरलेले आहे. तिच्या चार हातांपैकी एका हातात बाण, दुसऱ्यात अंकुश, तिसऱ्यात इक्षुचाप,  चौथ्यात  पाश आहे. समोरच्या  भिंतीत  जटाधारी कानफाट्या नाथसिद्धाची  व्याख्यान मुद्रेत बसलेली मूर्ती आहे. या लेण्यात दक्षिणेकडील भिंतीचे मागील बाजूस दरवाजाच्या पूर्वस छोट्या चौकोनात ९, पूर्वेकडील भिंतीत १९ व उत्तरेकडील भिंतीत २९ ,पश्चिमेकडील भिंतीत १९, व पुन्हा  व दक्षिणेकडील भिंतीत दरवाजाच्या पश्चिमेस ९  अशी  एकूण ८५  शिल्पे आहेत. ही सर्व शिल्पे  बहुतेक नाथ योग्यांची आहेत. या शिल्पांतील बहुतेक सर्व सिद्ध व्याख्यान मुद्रेमध्ये, पद्मासनात, अर्धमत्सेंद्रासनात, तर क्वचित चालताना आहेत. लेण्यांच्या बाहेर उघड्या प्रांगणावर लाकडी मंडप घालण्याची योजना होती, असे भिंतीतील खाचांमुळे स्पष्ट होते. दाराबाहेर एक छोटासा कट्टा आहे. तर थोडे उत्तरेकडे  वळल्यावर डाव्या बाजूस भैरव, हनुमान यांची  कोनाड्यात कोरलेली शिल्पे आहेत.हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत. यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे. या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत   चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे.

२४ ते २८ गट

या गटातील लेणी आकाराने लहान असून यात वैशिष्टपूर्ण असे काहीच आढळत नाही. फक्त २५  क्रमांकाच्या लेण्याच्या  प्रांगणात एक एकाश्म  लिंगयुक्त  मंदिर कोरले आहे.




एकंदरीत पन्हाळे-काजी हे ठिकाण वज्रयान पंथाचे प्रमुख ठाणे होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाच्या दृष्टीनेही याचे अत्यंत महत्त्व आहे. येथील लेणी कला व स्थापत्य या व्यतिरिक्त धार्मिक परंपरेत झालेल्या बदलांच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. पन्हाळे-काजी येथील लेण्यांच्या अभ्यासातून हीनयान बौद्ध पंथाचे तांत्रिक वज्रयान पंथात कसे रूपांतरण झाले व पुढे हे ठिकाण शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायापर्यंत कसे विकसित होत गेले, हेही समजते.

पन्हाळेकाजीचे लेणे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, याकरता अनेकांकडून अथक प्रयत्न झाले. पण धार्मिक स्थित्यंतरे पाहणाऱ्या या लेण्यांना आजही म्हणावी तितकी प्रसिद्धी लाभलेली नाही. सध्या पर्यटन संख्या वाढते आहे, पण तरीही ती संख्या सुमार म्हणण्या इतपतच आहे. फक्त एक सुदैवाची बाब म्हणजे भारतीय पुरातत्त्व खात्याकडून या लेण्यांची उचित देखभाल होत आहे.

संदर्भ :
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) देशपांडे, मधुसूदन नरहर, ‘ठाणाळा बौद्धलेणी – पन्हाळे काजी, वज्रयान केंद्र शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायावर नवा प्रकाश’, विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर, १९८१.
Deshpande, M. N., ‘The Caves of Panhāle-Kājī (Ancient Pranālaka)ʼ, Memoirs of Archaeological Survey of India, 84, New Delhi, 1986.
३) Sarde, Vijay, ‘Recently Deciphered Iconographic Representations of Kanifnath and Bahudi’, Historicity Research Journal, Solapur, Vol. 5 (1), September 2018.
४) https://marathivishwakosh.org/37085/
५) संदर्भ: व्याख्यान दुसरे-तिसरे : म.न.देशपांडे
६)  शोध पन्हाळेदुर्ग परिसराचा : शशिकांत शेलार 
७) लेख – पन्हाळेकाजीची लेणी, शिलालेख : भालचंद्र दिवाडकर दै.सागर ( रत्नागिरी आवृत्ती )
८) ईये महाराष्ट्र देशी-प्र.के.घाणेकर
९) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
१०) https://mundotraveller.blogspot.com/2020/12/khed-and-nearby-areas.html
११) https://talukadapoli.com/places/panhale-kazi-caves-research/









पन्हाळे-काजी : कोकणातील एक तांत्रिक वज्रयान केंद्र (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे एकूण २९ लेणी सापडल्या. इ.स. दुसर्‍या शतकापासून लयन निर्मितीस प्रारंभ झाला, ते तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंत सुरू होते. हीनायन, वज्रयान हिंदू नाथपंथीय याप्रमाणे येथील परीवर्तने पाहावयास मिळतात, ती केवळ देशपांडे यांच्या तरल बुद्धिमत्तेमुळेच स्पष्ट झाली, असे मानावे लागते. पन्हाळे-काजी येथील वज्रयान पंथीयांचा संपर्क कान्हेरी , तसेच पूर्व भारतातील बिहार येथील वज्रयान संप्रदायाशी होता. पुढे हेच वज्रयानपंथी केंद्र नाथ संप्रदायाकडे वळले असावे. यासारखी मते देशपांडे सप्रमाण नोंदवतात. लेणीसमूहातील एकूण २९ लेण्यांपैकी १४ लेणी इ.स. तिसर्‍या ते पाचव्या शतकापर्यंत पूर्ण झाली होती, तर क्र.१,३,१२ व १३ या बाराव्या शतकात हिंदू लेणी म्हणून कोरली गेली. तेराव्या शतकात लेणी क्र. २४, २६ व २९ विकसित झाली. लेणे क्र. १९ ची रचना करताना पुढे मोकळे प्रांगण ठेवून, त्यानंतर मंडप व प्रदक्षिणा पथयुक्त सांधार गर्भगृह खोदले. येथेच करोटक वितान व बाजूने समतल वितान ठेवले गेले, शिवाय प्रवेशालगत कठडा आहे. क्र. २९ चे लेणे खोदताना पुढे प्रांगण, उत्तर बाजूला एकाश्म खडकातील खोदकाम, तर दक्षिण बाजूला भिंत बांधली आहे. येथे ८५ पट असून अशा चौकोनी स्तबकात आदिनाथ आणि गिरीजा, तसेच मच्छिंद्रनाथ, त्रिपुरसुंदरी व गोरक्षनाथ दाखवले आहेत. पन्हाळे-काजीचे वैशिष्ट्य म्हणजे लेणी क्र. १० मधील महाचण्डरोषणाची मूर्ती तांत्रिक वज्रयान पंथाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते.

     महाचण्डरोषण : यालाच ‘चंडरोषण’ किंवा ‘अचल’ असेही म्हणतात. हत्ती व सिंह असलेल्या सप्तरथ अधिष्ठानावर हा स्थिर आहे. चंडरोषणाच्या अन्यही प्रतिमा या परिसरात मिळाल्या आहेत. चण्डरोषण दिसायला भयंकर, हातात खड्ग व तर्जनी पाश घेतलेला, डावा गुडघा जमिनीवर टेकलेला, वीरासनात दिसतो. पुढे पंधराव्या-सोळाव्या शतकात नेपाळमध्ये कापडी थकावर व तिबेटमध्ये अठराव्या शतकात या मूर्ती पाहावयास मिळतात. याची पूजा, उपासना अत्यंत गुप्तपणे करावी असा संकेत आहे.

     तांत्रिक उपासनेचा प्रणेता, मैत्रेय मानला जातो. बुद्धाच्या नंतर एक हजार वर्षांनी महायान पंथात या तंत्रयानाचे आरोहण झाले. साधारणपणे सहाव्या शतकात औरंगाबाद, वेरूळ यांही ठिकाणी वज्रायान पंथ दिसायला लागतो. तो अवलोकितेश्वराच्या स्वरूपात. ओरिसा, तसेच बंगाल आणि खाली आंध्र-कर्नाटकातसुद्धा या पंथाचे लोण पसरले होते. या पंथात उपासना करताना, विशेषत: चंडरोषणाचे ध्यान करताना मुकुटावर अक्षोभ्याची प्रतिमा आहे अशी कल्पना केली जाते. पन्हाळे-काजी येथे अक्षोभ्याच्या जवळपास पाच प्रतिमा मिळाल्या. अक्षोभ्य देवता परिवार पंचध्यानी बुद्धांच्या कल्पनेशी निगडित आहे. हा पंचध्यानी बुद्ध आदिदेव असून त्याचा मूळ वज्रयान पंथ अनेकेश्वरवादी झाला. यासारखे तपशील नोंदवताना पुढे या पंथाची जागा नाथ पंथीयांनी कशी घेतली हे ते सांगतात.

     शिलाहार काळात विकसित झालेल्या लेण्यामध्ये या बाबी प्रामुख्याने अधोरेखित केल्या गेल्या. वज्रयानामध्ये सुमारे आठव्या-नवव्या शतकापासून ८४ सिद्धांचे युग सुरू झाले असे म्हटले जाते, आणि ही ८४ सिद्धांची परंपरा नाथपंथामध्येही काही फरकाने सामावली  आहे. तांत्रिक वज्रयान पंथात ८४ सिद्धांची नावे मिळतात. नेपाळ व तिबेट येथे या सिद्धांची पूजा अद्यापही प्रचलित आहे. अर्थात, या परंपरेचा समन्वय स्पष्टपणे दाखवणे तितकेसे सोपे नाही ही बाब ते नोंदवतात. असे करताना लेण्यात असलेल्या मूर्तिशिल्पांची निश्चिती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यासाठी ते या पंथाचे संपूर्ण तत्त्वज्ञान, ज्ञानेश्वरी व तत्कालीन अन्य उल्लेख यांचे दाखले देतात.  एकूण, पन्हाळे-काजी येथील लेण्यांतील मूर्तिशिल्पांचे स्पष्टीकरण व नामनिश्चिती करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा एक अविस्मरणीय असा ठसा आहे. यामुळे महाराष्ट्राच्या, विशेषत: कोकणाच्या सांस्कृतिक इतिहासाचे वेगळे दालन त्यांनी अभ्यासकांपुढे उभे केले.









No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...