![]() |
| लेणी क्रमांक १ |
हे एक छोटे भिक्षु निवास आहे सध्या ते मातीने पूर्ण भरलेले असून त्यावरील शिलालेख हि अस्पष्ट झालेला आहे या लेण्या भिक्षु ना राहण्यासाठी बांधल्या असून या लेण्या मुख्य लेण्याच्या अगदी उजव्या हाताला असणारी छोटी लेणी आहेत याचा वापर राहण्यासाठी किंवा अध्ययनासाठी केला जात असावा. हे लेणी कोरणाऱ्याचे लेखामध्ये नाव आहे पण ते सध्या अस्पष्ट झालेले आहे वाचता येत नाही इथे कोणती हि कलाकुसर आपणास पाहायला मिळत नाही कारण लेणी मातीने पूर्ण भरलेली आहेत.उत्तरेकडिल या लेण्यात ३ X ३.६ मीटरचे साधे सभागृह आहे.त्यास ओटा किंवा खोल्या नाहीत.
लेणी क्रमांक २. :
![]() |
| लेणी क्रमांक ३ |
हे एक छोटेसे विहार आहे अगदी प्रमुख लेण्याच्या बाजूलाच हे कोरलेले आहे व याच्याच बाजूंला प्रमुख लेण्याविषयी चा शिलालेख आहे या लेण्यांची पडझड झालेली असून आतमध्ये एक कोरीव आसन आहे जे भिक्षु ना ध्यान साधना करण्यासाठी कोरलेले आहे या तिथे आराम करण्यासाठी ते कोरलेले असावे. अगदीच छोट्या आकाराचे असे हे लेणे आहे छोटा दरवाजा आणि आतमध्ये आडव्या पद्धतीने आसन आहे बाकी लेणे हे प्रमुख लेण्याच्या बाजूलाच आहे. सध्या लेणे हे भग्न अवस्थेत आहेत समोर मातीने पूर्ण भरलेले आहे.सध्या याच्या फक्त दोन भिंती शिल्लक आहेत.
लेणी क्रमांक ३. :
![]() |
| लेणी क्रमांक २ |
![]() |
| लेणी क्रमांक २ |
लेणी क्रमांक ४. :
हि देखील भिक्खू निवास आहे. या लेण्यात एक आसन व्यवस्था आहे शिवाय या लेण्याच्या चौकटीवर एक शिलालेख आहे या लेण्याचा दरवाजा व एक खिडकी असे प्रवेश करण्यासाठीची समोरील जागा आहे आतमध्ये कोरीव खोदकाम केले आहे. या लेण्याच्या प्रवेशद्वारावर प्राकृतब्राम्ही शिलालेख आहे.
भद्र उपासकाची कन्या व सिवदत्त ( शिवदत्त ) याची पत्नी धम्म सिरी ( धर्मश्री) हिने धम्म दान केलेली लेणी असा उल्लेख या लेण्यावर आहे सिवदत्त व त्याच्या बायकोने हि दोन लेणी दान केलेली आहेत. लेण्यांची माडणी साधी आहे केवळ भिक्खू ना राहण्यासाठी हि निवासस्थान म्हणून कोरलेली आहेत.यात राजवंध व तिथीचा उल्लेख नाही.
लेणी क्रमांक ५ :
![]() |
| लेणे क्रमांक ५ |
हा मुख्य विहार आहे . गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ह्या लेण्यात काही नाणी वैगरे सापडली आहेत या लेण्यांची कमान आपणास स्पष्ट पाहायला मिळते शिवाय लेण्यांच्या आतमध्ये एक छोटी संघाराम पाहायला मिळते तसेच हे विहार ऐसपैस असे आहे. लेण्याच्या डाव्या बाजूला आतमध्ये एक खोली आहे कदाचित या खोलीमध्ये एखादे मुर्तीस्वरूप असण्याची शक्यता आहे कारण लेणी पूर्ण मातीने भरलेली आहेत. याचे सभाग्रूह ४.५ ३.६ मीटर आकाराचे आहे.
या लेण्याच्या डाव्या बाजूला भिंतीवर एक शिल्लेख कोरलेला आहे. या प्राकृत ब्राम्ही शिलालेखात राजवंश व तिथीचा उल्लेख नाही. यात '' ठरट गह्पती पुतस सेठीस संघरखित सदय धम लेन असा उल्लेख याचा अर्थ ठरट गृहपतीचा मुलगा श्रेष्टी संघरक्षित याने हे धम्म लेन दान दिल्याचा उल्लेख आहे या उल्लेखानुसार हे मुख्य लेणे असून बौद्ध धम्माशी सबंधित आहे अश्या प्रकारचे विहार इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही कारण या ठिकाणी विहाराचे प्रवेश द्वार समोर असून आतमध्ये डाव्या बाजूस एक खोली आहे त्यामध्ये प्रार्थनेसाठी एखादे शिल्प असू शकते
हे लेण्यासाठी दान देणारा ठरट गृहपती हा व्यापारी आहे आणि या व्यापाऱ्याने हे लेणे दान दिल्याचा उल्लेख आहे. या लेण्यांचे बांधकाम साधारण इसवी सन पूर्व पहिल्या शतकात केलेलं आहे. याची बांधणी शैल गृहाप्रमाणे आहे एक मोठे विहार म्हणून आपण ते पाहू शकतो मातीने भरल्यामुळे त्याचा दर्शनी भाग आपणास छोटा वाटतो परंतु हे मोठे प्रशस्त असे लेणे आहे. याच्या आतमध्ये असणारी खोली देखील पूर्णपणे भरलेली आहे या लेण्यांचे एकून आकारमान येथील सर्व लेण्यापेक्षा मोठे असून हे मुख्य लेणे आहे. लेण्यावर कोणती हि कलाकुसर नाही पण कोरीव शिलालेख मात्र आहेत.
![]() |
| फोटो च्या कोपऱ्यांत मातीखाली हि लेणी आहेत |
लेणे क्रमांक ६ व ७ दुसर्या समुहात मोडतात.लेणे क्र.६ चा समोरचा भाग पडल्यामुळे एखाद्या नैसर्गिक गुहेसारखे वाटते. हा एक विहार आहे पण हा सध्या पूर्ण मातीखाली गाडला गेलाय याच्या आजूबाजूच्या कोरीव खुणा फक्त दिसत आहेत याचे उत्खनन केल्यास ते एक मोठे संघाराम सापडेल या इथे एक भिक्खू निवास असण्याची शक्यता आहे हे लेणे मातीखाली असल्यामुळे याची जास्त माहिती सांगता येत नाही.मागील बाजुस दोन खोल्या व उजव्या बाजुस एक खोली असणारे सभागृह इथे असावे.
लेणी क्रमांक ७ :
![]() |
| लेणी क्रमांक ७ |
लेणे क्रमांक ३.४ व ५ मधील शिलालेखाच्या पुरालिपीवरुन या लेण्यांचा कालावधी इ.स. दुसर्या शतकातील पुर्वार्ध असा निश्चित करता येतो.
या दोन्ही समुहाशिवाय महाडच्या इशान्येस काही खोल्या व एक टाके असलेला एक तिसरा समुहही आहे.शिवाय नागोठणे कडे जाताना रस्त्याजवळच्या टेकडीच्या दक्षिण बाजुस एक खोली कोरली आहे.
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
३) आयु प्रशांत माळी, रविंद्र मिनाक्षी मनोहर, मुकेश जाधव यांचे लेखन
४) सुनील पाटकर : सकाळ वृत्तसेवा
https://www.navarashtra.com/lifestyle/travel/caves-of-kol-are-not-maintained-by-archaeology-department-nrsr-67929/
दुसऱ्या क्रमांकाच्या लेण्यात पूजा स्थळ असावे. या ठिकाणी काही नाणी सापडल्याचे गावकरी सांगतात. या लेण्याच्या डाव्या बाजूला एक शिलालेख आढळून येतो. ‘ठरट गृहपतीचा मुलगा श्रेष्टी संघरखित याने हे धम्मलेन दान’ दिल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे. विहाराच्या आत डाव्या बाजूला एक खोली देखील आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये ही लेणी दान देणाऱ्या सिवदत्त आणि सिवदत्त यांची पत्नी धम्मसिरी यांचा उल्लेख आहे. ही सर्व लेणी आतून-बाहेरून मातीने भरलेली असल्यामुळे आपले मूळ सौंदर्य हरवून बसली आहे. राज्य सरकारने भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करून या भागात संशोधन केल्यास आणखी काही लेणी आढळून येण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाने लेण्यांकडे जाण्यासाठी चांगला पायरी मार्ग आणि लेण्यांची स्वच्छता केल्यास या ठिकाणीही पर्यटन पर्यटनाला चांगले दिवस निश्चितपणे येऊ शकतात.
By सुनील पाटकर : सकाळ वृत्तसेवा
मुकेश जाधव
लेणी संशोधक
मो नं : 97301 29266
आयु प्रशांत माळी
लेणी संशोधक
मो नं : 82911 78023 रविंद्र मिनाक्षी मनोहर
गडकोट लेणी संशोधक
धम्मलिपी अभ्यासक
मो नं : 8369090124









No comments:
Post a Comment