Wednesday, December 8, 2021

मिरगड

 मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्गावर असणारे पेण हे गाव शाडूच्या गणेशमूर्तींसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या पेण तालुक्यात सांकशी, रत्नगड आणि मिरगड असे तीन किल्ले येतात. या तीन किल्ल्यांपैकी सांकशीचा किल्ला हा बरीच माहिती उपलब्ध असल्याने पुण्या-मुंबईकडील सर्व ट्रेकर्सना सुपरिचित आहे. मात्र महल मीरा डोंगररांगेत येणारे रत्नगड आणि मिरगड हे किल्ले माहितीच्या अभावामुळे अल्पपरिचित बनले आहेत. त्यामुळे फार कमी म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच ट्रेकर्स या किल्ल्यांना भेट देतात.  महाराष्ट्रात सोनगड/सोनगीर नावाने ओळखले जाणारे अनेक किल्ले आहेत. पेणजवळच्या महालमिऱ्या डोंगरावर उभ्या असलेल्या मिरगड किल्ल्यालाच सोनगीर किल्ला या नावाने देखील ओळखला जातो. किल्ल्याचा आकार व त्यावरील ठरावीक अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी केला जात असावा. 
         महालमिर्‍या डोंगरासंदर्भात एक कथा सांगितली जाते.राम-रावणाचे युध्द सुरु असताना इंद्रजिताची शक्ती लक्ष्मणाला लागून लक्ष्मण रणांगणात पडला तेव्हा लक्ष्मणाला बरे करण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी वनस्पतॉची आवश्यकता होती.हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलून लंकेत जात असताना द्रोणागिरी पर्वताचे मिरी एवढा ढेकूळ इथे पडले.ते म्हणजे मिर्‍या डोंगर अशी स्थानिकात समजुत आहे.
Mirgad as seen from Mango Tree (P.C. Aniruddha Shinde)
     मिरागड हा कोणतेही अवशेष नसलेला किल्ला आहे. मिरगडाला फारसा इतिहास उपलब्ध नाही. इ.स १६६२ मध्ये मोगल सरदार नामदारखान याने पेण व आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला होता. तेव्हा झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी भाग घेतला होता. ही लढाई मिरगडच्या परिसरात झाल्याचा उल्लेख आढळतो. 
 काही कागदपत्रात मिरगडाचा उल्लेख २८ मार्च १७४० मधे येतो. संभाजी आंग्रे यांच्या मदतीसाठी जेव्हा चिमाजी अप्पा आणि नानासाहेब पेशवे या परिसरात आले होते तेव्हा त्यांनी पाली, उरण आणि मिरगड हे भूभाग जिंकून घेतले अशी माहिती आंग्रे यांच्या पत्रव्यवहारात मिळते. ​त्यांनी तुळाजी आंग्रे यांस कैद करून पाली, मिरगड हा भाग ताब्यात घेतला.
Mirgad GPS Map
         मुंबई-पुण्याहुन जवळ असलेला हा किल्ला एका दिवसात सहजपणे पहाता येतो व वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास या किल्ल्यासोबत जवळच असलेला रत्नदुर्ग किल्ला देखील पहाता येतो.
या गडावर जायचे तर दोन पर्याय उपलब्ध आहेत.
Return journey to Zapadmachi
१) कोंढवी मार्गे :-
     कोकण रेल्वेने पेण नंतरच्या कासू स्थानकावर उतरायचे. कासू पासून ‘पाबळ’ फाट्यावर जाणार्‍या अनेक रिक्षा आहेत. ‘पाबळ’ फाट्यावरुन ‘कोंढवी’ गाव ९ किमी अंतरावर आहे. ‘कोंढवी’ गावातून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. तसेच ‘कोंढवी’ च्या पुढे ३ किमी अंतरावर ‘झापडी’ गावातून सुध्दा किल्ल्यावर जाणारी वाट आहे. ही वाट साधी सोपी सरळ कमी दमझाक करणारी आहे. या दोन्ही गावातून किल्ल्यावर जाणार्‍या वाटा एका पठारावर येऊन मिळतात.
‘झापडी’ गावात उतरल्यावर रस्त्याच्या डावीकडच्या डोंगरसोंडेवर चढायचे. पाऊण तासातच आपण एका पठारावर पोहोचायचे. पठारावरुन उजवीकडची वाट धरायची. लक्षात ठेवण्यासारखी खूण म्हणजे पठारावर जिथून उजवीकडे वाट वळते, तिथे एक डेरेदार वृक्ष आपल्याला सावली देण्यासाठी उभा आहे. येथून समोर पाहिल्यावर आपल्याला चार उंचवटे दिसतात. यापैकी नक्की किल्ला कुठला ? हा प्रश्न आपल्याला मनात आल्याशिवाय राहत नाही. डावीकडून दुसरा उंचवटा म्हणजे आपले इच्छित स्थळ किल्ले ‘मिरगड / सोनगिरी’. पठारावरुन वाट सरळ एका धनगरवाडीत जाते. पहिल्या उंचवट्याच्या डावीकडून एक वाट पलिकडच्या कोंढवी गावात उतरते, तर एक वाट डोंगराच्या दिशेने पुढे सरकते ही वाट या किल्ल्याला डावीकडे ठेवत तिरपी तिरपी दोन शिखरांमधील खिंडीत पोहोचते. येथून गडमाथ्यावर जाण्यास १० मिनिटे लागतात.
कोंढवी गावातून दिसणारा मिरगड

झापडी मार्गे :-
     मिरगडला जाण्यासाठी प्रथम पेण शहर गाठावे. मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्गावर पणजीकडे जाताना वडखळ नाका ओलांडल्यानंतर कासू नावाचे कोकणरेल्वेचे स्टेशन लागते. या कासू गावानंतर महामार्गावरच थोडे पुढे पाबळ गावाला जाणाऱ्या फाटयावर डावीकडे वळायचे. हा रस्ता पुढे रेल्वे पुलाखालून निगडे, पाबळ, कोंढवी अशी छोटी छोटी गावे ओलांडत शेवटी झापडी या गावाजवळ संपतो. कोंढवी गावातूनच चार छोटे छोटे उंचवटे असणारा मिरगड दिसायला लागतो. तशी एक वाट या कोंढवी गावातूनही मिरगाडावर जाते पण ही वाट थोडी लांबची असल्याने आपण मात्र जरा आणखी पुढचे झापडी गाव गाठायचे.  झापडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव मुंबईहुन १०२ कि.मी.अंतरावर तर पुण्याहुन १४० कि.मी.अंतरावर आहे. झापडी गावात जाण्यासाठी पेण-वडखळ-पाबळ-कोंढवी-झापडी असा गाडीमार्ग असुन मुंबई गोवा महामार्गावर वडखळहुन १० कि.मी. अंतरावर पाबळला जाणारा फाटा आहे. या फाट्यावरून झापडी गाव १० कि.मी. आत आहे. झापडी गावातुन एक कच्चा रस्ता गडाच्या माचीवर असलेल्या सोनगीरवाडी या १०-१२ घरांच्या वस्तीकडे जातो. जीपंसारखे वाहन असल्यास आपण थेट किल्ल्याच्या माचीवर असलेल्या या वाडीत पोहोचतो अथवा २ कि.मी.चे हे अंतर पायी पार करावे लागते. या रस्त्यावरील दोन वळणावर मोठया प्रमाणात भुसभुशीत माती असल्याने मोटरसायकल देखील घसरते हि गोष्ट लक्षात ठेवावी. गावातील तरुण मात्र त्यांच्या रोजच्या सरावाने हा रस्ता सहज पार करतात. झापडी गावातून साधारण एक तास चालून आलो कि आपण पठारावर पोहोचतो आणि समोर मिरगडाचा डोंगर जवळ दिसायला लागतो. 
Mirgad

            किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वत: करावी. कोंढवी मार्गे २ तास लागतात. झापडी मार्गे सव्वा तास लागतो. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे पाण्याचा भरपूर साठा स्वत: जवळ बाळगावा या सर्व सुचना लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
      झापडी’ गावात उतरल्यावर रस्त्याच्या डावीकडच्या डोंगरसोंडेवर चढायचे. पाऊण तासातच आपण एका पठारावर पोहोचायचे. पठारावरुन उजवीकडची वाट धरायची. लक्षात ठेवण्यासारखी खूण म्हणजे पठारावर जिथून उजवीकडे वाट वळते, तिथे एक डेरेदार वृक्ष आपल्याला सावली देण्यासाठी उभा आहे.  या झाडाखाली थोडी विश्रांती घ्यायची आणि तासाभाराचे अंतर चालून लागलेला थकवा घालवायचा. येथून समोरच आपल्याला मिरगडाचा डोंगर दिसायला लागतो. 
येथून समोर पाहिल्यावर आपल्याला चार उंचवटे दिसतात.  यापैकी नक्की किल्ला कुठला ? हा प्रश्न आपल्याला मनात आल्याशिवाय राहत नाही. डावीकडून दुसरा उंचवटा म्हणजे आपले इच्छित स्थळ किल्ले ‘मिरगड / सोनगिरी’.यापैकी डावीकडून दुसऱ्या आणि तिसऱ्या डोंगरावर किल्ल्याचे थोडेफार अवशेष शिल्लक आहेत. या झाडाखाली पठारावरच्या धनगरवाडीतली काही माणस किंवा खेळणारी पोर नक्की भेटतात. त्यांनाच किल्ल्यावर जाण्याची वाट विचारायची. अगदी कुणी भेटलच नाही तर निराश न होता समोर उजवीकडे धनगरवाडीत जाणारी वाट धरायची. गावकरी या किल्ल्यावर नाचणीची शेती करत असल्याने तसेच त्यांची गुरे चरायला नेत असल्याने वाट पुर्णपणे मळलेली आहे. हि धनगरवाडी म्हणजे वीस घरांची छोटी वस्ती. किल्ल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या मोकळ्या पठारावर शेती करणे हा इथल्या लोकांचा व्यवसाय. घरटी एक माणूस मुंबईत कामानिमित्त राहणारा. किल्ल्यावर पाणी नसल्याने या वाडीतच आपल्या जवळच्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या आणि गावातल्या एखाद्या माणसाकडून किल्ल्याकडे जाणारी वाट निट समजून घ्यायची. वाडीबाहेर आल्यावर तिसऱ्या टेकडीच्या टोकाकडील खिंडीतून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. 


मिरगडाचा डावीकडचा सगळ्यात पहिला डोंगर. या डोंगरवर कोणतेही अवशेष नाहीत.


 पहिल्या उंचवट्याच्या डावीकडून एक वाट पलिकडच्या कोंढवी गावात उतरते, तर एक वाट डोंगराच्या दिशेने पुढे सरकते ही वाट या किल्ल्याला डावीकडे ठेवत तिरपी तिरपी दोन शिखरांमधील खिंडीत पोहोचते. येथून गडमाथ्यावर जाण्यास १० मिनिटे लागतात.
किल्ल्यावर असणारे जुन्या बांधकामांचे अवशेष

             मिरगड समुद्रसपाटीपासून १०४०  फुट तर धनगरवाडीतून फक्त १०० फुट उठावला आहे. त्यामुळे धनगरवाडीपासून अर्ध्या तासात आपण दोन डोंगरांमुळे तयार झालेल्या खिंडीत येऊन पोहोचतो.किल्ल्याचा परीसर साधारण १ एकर आहे. किल्ल्याच्या पहिल्या टेकडावर वास्तुचे तुरळक अवशेष असुन या ठिकाणी असलेल्या झाडीत गावकऱ्यांनी किल्ल्यावर सापडलेल्या २-३ मुर्ती आणुन ठेवल्या आहेत. आता प्रथम आपला मोर्चा डावीकडील डोंगराकडे वळवायचा. या डोंगरावर जुन्या बांधकामचे अवशेष दाखवणारी दोन बांधकामाची जोती आहेत. बाकी तसे या डोंगरावर कोणतेच अवशेष नाहीत.  येथुन समोर टेकडावर असलेला किल्ला व त्यावरील संपुर्ण अवशेष नजरेस पडतात. या टेकडावरुन खाली खिंडीत येउन दुसऱ्या टेकडावर जाताना उध्वस्त तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. गडाचा दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला आहे. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुस एका मंदिराचे जोते असुन डाव्या बाजुस गडाचा ढासळलेला बुरुज आहे तर समोरच कातळात खोदलेले पाण्याचे मोठे टाके दिसते. बुरुजाशेजारी असलेला वास्तुचा चौथरा त्यावर केलेल्या नाचणीच्या शेतामुळे ठळकपणे दिसुन येत नाही.
   आता पुन्हा खिंडीत परत यायचे आणि उजव्या हाताचा डोंगर चढून वर जायचं. 
पाण्याचे टाके
Water Cistern atop fort

गडावर दोन पाण्याची टाकी आहेत मात्र दोन्ही टाकी उपसा नसल्याने कोरडी पडली आहेत

या डोंगरावर समोरच पूर्वेकडील टोकाला एक आणि थोडे पुढे दक्षिणेला अशी दोन पाण्याची टाकी आहेत. मात्र उपसा नसल्याने दोन्ही टाकी आज कोरडी पडलेली आहेत. या डोंगरवर सुद्धा काही जुन्या बांधकामाची जोती दिसतात.टाक्याच्या पुढील भागात काही वास्तु अवशेष पसरलेले असुन उजवीकडील उंचवट्यावर एक मोठा चौथरा पहायला मिळतो. या उंचवट्याच्या पुढील बाजुस एक लहान सुकलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या या उंच भागातुन दुरवर कर्नाळा व माणिकगड तर समोरच रत्नदुर्ग किल्ला नजरेस पडतो. तर दक्षीणेला खाली रत्ना नदीचे खोरे सुरेख दिसते.रत्ना नदी रत्नगडाजवळ उगम पावते.किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.  हे सर्व अवशेष पाहून उत्तरेकडील चौथ्या उंचवटयाकडे जाणारी पायवाट धरायची. 
     आता या चौथ्या उंचवटयावर गडाची देवता म्हणजे झाडीत दोन पाषाणात कोरलेल्या मुर्त्या आहेत. बहुदा पूर्वी गडावर एखादे मंदिर असावे आणि त्या मंदिरातील या मुर्त्या मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर कुणीतरी येथे झाडीत आणून ठेवल्या असाव्यात. या चौथ्या उंचवटयानंतर पुन्हा लांबवर पसरलेले पठार आणि पाचगणी नावाचे छोटे गाव दिसते. रेंज ट्रेक करण्याची इच्छा असणाऱ्या भटक्यांसाठी पाचगणी गावाकडून येणारी वाट हा मिरगडला येण्यासाठी दुसरा उत्तम पर्याय होऊ शकतो. काही ट्रेकर्स पेण जवळील रत्नगडाला आधी भेट देतात आणि मग प्राचीन व्याघ्रेश्वर शिवमंदीर व त्याजवळील धबधबा पाहून पाचगणी मार्गे मिरगडला येतात. 
गडावरील देवतांच्या भग्न मूर्ती

गडाच्या शेवटच्या छोट्या उंचवट्यावर झाडाखाली या जुन्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत

         आता येथे आपली मिरगडाची ३ तासांची छोटेखानी भटकंती पूर्ण होते. मिरगडाला भेट देण्यासाठी पावसाळयाचा कालावधी सर्वोत्तम कारण गडावर फारसे अवशेष नाहीत आणि उन्हाळ्यात कोकणातील वातावरण चांगलाच घाम काढते. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची, निवाऱ्याची आणि जेवणाची कोणतीही होय नाही. मात्र पठारावरील धनगरवाडीत पूर्व कल्पना दिल्यास काही घरांमध्ये जेवणाची सोय होऊ शकते.
         गडावर आता कुठलेही अवशेष नसले तरी हा ट्रेक अतिशय सुंदर व ट्रेकर्सचा कस पहाणारा आहे.  गडाच्या माचीवर अंदाजे ४०० वर्ष जुने व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. देवळाच्या बाजूने वर येण्यासाठी सुबक पायर्‍या आहेत. बाजुला लहानसे कुंड आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजुस खांब आहेत. मंदिरात शिवलिंग आहे. देवळाला वळसा घालून मागील बाजूस उतरल्यावर पावसाळ्यात १०० फूटावरुन पडणारा धबधबा दिसतो. इथून तळकोकणाचे सुरेख दृश्य दिसते.तर महल मीरा डोंगर रांगेतील रत्नगड ते मिरगड अशी दोन दिवसाची सुंदर पावसाळी भटकंतीसाठी नक्की करावी. वेळ असेल तर पेण जवळचा सांकशीचा किल्ला ही या भटकंतीमधे पहावा.

 संदर्भग्रंथ :-
 १) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३) रायगड जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा” – श्री. सचिन जोशी
४) शोध शिवछत्रपतीच्या दुर्गांचा -सतिश अक्कलकोट
५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
६) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
७) www.durgbharari.in  हि वेबसाईट
८) www.trekshitiz.com हि वेबसाईट
९) श्री. विनीत दाते, श्री विराग रोकडे यांचे लिखाण 



 https://madhyalok.wordpress.com/2019/07/31/mirgad/

















No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...