महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील तालुक्याचे हे एक ठिकाण प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ केळना नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. स्थानिक दंतकथा या नगराला कृष्णशत्रू भौमासुराची राजधानी मानते. दंतकथेनुसार याचे नाव भोगवर्धन किंवा भगदनाथ या राजाच्या नावाचा अपभ्रंश होऊन झाले असावे. सिल्लोड-जाफराबाद रस्त्यावर सिल्लोडच्या पूर्वेस सु. २० किमी.वर वसले आहे. हे स्थल छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबादपासून ) ६४ किमी. अंतरावर असून अजिंठा मार्गावर आहे. हे ठिकाण उज्जयिनी (उज्जैन) ते पैठण या व्यापारी मार्गावर दण्डक अरण्यात वसले होते, असा प्राचीन वाङ्मयात तसेच मार्कण्डेयादी पुराणांत व अनेक उत्कीर्ण लेखांत याचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी हे जनपद होते आणि नंतर त्याला विषयाचा (प्रांताचा) दर्जा प्राप्त झाला. येथील रहिवाशांनी सांची व भारहूत येथील स्तूपांच्या बांधणीस दान दिल्याचे उल्लेख तेथील अभिलेखांत आढळतात. माहिष्मतीचा कलचुरी राजा शंकरगण याने भोगवर्धन विषयातील एका गावातील जमीन ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख ५९७ च्या लेखात आहे. सहाव्या शतकात, शंकरगण ह्या महिष्मतीस्थित कलचुरीवंशी राजाने भोकरदन भागातील जमीन ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख अभोणा ताम्रपटात मिळतो. चालुक्य जयसिंह दुसरा याचा मांडलिक राष्ट्रकुट राजा कान्हारदेव याच्या ताम्रपटातील ‘विषय’ प्रत्ययावरून भोकरदन हे जिल्हास्तरीय ठिकाण होते, असे म्हणता येते.
साधारण दोन हजार वर्षापूर्वी भारतात आलेल्या एका ग्रीक प्रवाशाने ‘पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी’ या नावाच्या ग्रंथात हा उल्लेख केला आहे. तो म्हणतो. “दक्षिणापथ या प्रदेशातील व्यापारी स्थळांमध्ये दोन स्थळांना महत्त्व आहे. भडोचपासून दक्षिणेस वीस दिवसांच्या प्रवासाने गाठता येणारे पैठण आणि दुसरे म्हणजे तगर.
हे तगर म्हणजे आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे गाव. या दोन शहरासोबत केळना नदी तीरावरील भोगवर्धन म्हणजेच भोकरदन हे देखील प्रमुख व्यापारी केंद्र होते असा उल्लेख आढळतो. दक्षिणेतील पहिल्या व मोठ्या साम्राज्याची राजधानीच पैठण (प्रतिष्ठान) येथे होती. या राजकुलाने मराठवाड्याला राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत स्थान मिळवून दिले, तसेच साहित्यात आणि कलाक्षेत्रात मोलाची कामगिरी करण्यास प्रवृत्त केले. पैठण, तेर, भोकरदन ही गावे या काळातच भरभराटीस आली. अनेक व्यापारी मार्ग या शहरांवरून जात असत. इथल्या कारागिरांनी बनवलेल्या वस्तू, मराठवाड्यातील कापड युरोपमध्ये निर्यात व्हायचे.
ही तीन शहरे महानगरे ( आजच्या भाषेत मेट्रोपोलिटन सिटी) म्हणून ओळखली जात होती. या शहरांचा उल्लेख टॉलेमीने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात लिहिलेल्या प्रवासवर्णनातही आढळतो.
प्राचीन ‘भोगवर्धनʼचे पुरावशेष नदीच्या दोन्ही बाजूंना पांढरीच्या टेकाडांच्या रूपाने दृष्टीस पडतात. सातवाहन काळात हे एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याचे १९५८-५९ मध्ये विख्यात पुरातत्त्वज्ञ मधुसूदन देशपांडे यांच्या लक्षात आले. हे केंद्र प्राचीन व्यापारी मार्गावर होते व उज्जैन आणि पैठण या तत्कालीन महत्त्वपूर्ण केंद्रांशी तसेच जुन्नर, कार्ले, कान्हेरी, कल्याण इत्यादी केंद्रांशी जोडले गेले होते. मध्य प्रदेशातील सांची व भारहूत येथील शिलालेखांत या केंद्राचा येथील दानकर्त्यांच्या अनुषंगाने उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे मार्कंडेय पुराणातही भोगवर्धनचा उल्लेख येतो. येथे बौद्धधर्मीयांचे अनुयायी मोठ्या संख्येने राहत असावेत, असेही अनुमान केले गेले आहे. प्राचीन भोगवर्धन हे सध्याचे भोकरदन असल्याची खात्री होण्यासाठी, तसेच तत्कालीन भोगवर्धनचे महत्त्व जाणून घेण्याकरिता येथे १९७३-७४ या कालावधीत उत्खनन केले गेले. नदीच्या डाव्या भागाला, आलापूर या गावाच्या हद्दीत असलेल्या दोन पांढरीच्या टेकाडांचे पुरातत्त्वज्ञ शांताराम देव व रमेश गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे विस्तृत उत्खनन करण्यात आले.
उत्खननात दोन कालखंड आढळले. पहिल्या कालखंडात सातवाहनांचा आद्य व उत्तर काळ; तर दुसऱ्या कालखंडात क्षत्रपांच्या उत्तर काळाचे पुरावशेष निदर्शनास आले. उत्खननात पूर्वंसातवाहन, उत्तरसातवाहन आणि सातवाहनोत्तरकालीन भिन्न वस्त्यांचे बहुविध अवशेष आढळले. उत्तरसातवाहन काळातील भारताचा रोमन संस्कृतीशी असलेल्या व्यापारामुळे भोकरदनची भरभराट झाली. या समृद्धीमुळे कलाकौशल्याचे हे केंद्र बनले.
उत्खननात कारागिरांची अनेक घरे आढळली असून ती गुळगुळीत जमिनीची व कबेलूंनी शाकारलेल्या छतांची आहेत. पाटा-वरवंटा, जाते, पळ्या, थाळ्या, डाव, झाकण्या, मडकी इ. हरतऱ्हेच्या नित्योपयोगी वस्तू येथील घरांत मिळाल्या, या घरांतील सांडपाणी वाहून जाण्याचीही सोय चांगली होती. पहिल्या आद्य सातवाहन काळातील वास्तूअवशेषांनुसार यांची घरे आकाराने लहान, भिंती मातीच्या तर लाकडी खांबांच्या आधारावर कवेलू आच्छादित छप्पर होते. संपूर्ण घराची योजना कशी होती, याची कल्पना करता आली नाही; मात्र सातवाहनांच्या उत्तर काळातील अवशेष अधिक बोलके असून त्यांनुसार तत्कालीन समृद्ध भोगवर्धनच्या वैभवाची कल्पना करता येते. या काळातील घरे आकाराने मोठी, विटांच्या भिंतींची व योजनापूर्वक पायाभरणी केलेली आढळतात. या घरांची छपरे कवेलू आच्छादित होती. प्रत्येक कवेलू लाकडी वाशांवर घट्ट टिकून राहाण्याकरिता कवेलूंना दोन जागी भोक असे; जेणेकरून ती तारांनी लाकडी वाशांना बांधता येत. ही छपरे लाकडी खांबांच्या आधारावर होती. सर्वसाधारण घर पडवी, बैठकखोली व स्वयंपाकघर अशा तीन भागांत विभागले होते. स्वयंपाकघरात धान्य व इतर काही वस्तू वा पाणी यांची साठवणूक करण्याकरिता मोठाली कुंडे होती. तसेच स्वयंपाकघरातील वापरलेल्या पाण्याचा निचरा होण्याकरिता दोन प्रकारच्या शोषणकुंडांची व्यवस्था दिसून आली. पहिल्या प्रकारामध्ये भाजलेल्या मातीच्या कड्या एकावर एक ठेवून विहिरसदृश आकार दिलेला होता; तर दुसऱ्या प्रकारामध्ये मातीच्या कड्यांच्या जागी विटांचा वापर करून विहिरसदृश रचना केलेली होती. अशा स्वरूपाच्या रचनांमुळे सांडपाणी जमिनीत शोषून घेतले जाई. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे सांडपाणी परिसरात न पसरता जमिनीमध्ये त्याचा निचरा होई. वसाहतीचा विस्तार मात्र योजनापूर्वक आढळत नाही. पाच घरांचा समूह तसेच सभोवताली अरुंद रस्ते अशी वसाहतरचना होती.
उत्खननांत घरांच्या अवशेषांशिवाय काही नाणी, मृण्मूर्ती आणि दागिने सापडले. नाण्यांचे प्रकार आणि आकार भिन्न असून नाण्यांमध्ये काही आहत नाणी तसेच सातवाहन-क्षत्रप-कार्दमक आणि गुप्त राजे यांची तांब्याची, मिश्रधातूंची आणि सोन्याचा मुलामा दिलेली नाणी आढळली. येथे मिळालेल्या अनेक प्रकारच्या व आकारांच्या मण्यांत अफीक, प्रवाळ, रक्ताश्म, इंद्रनील, स्फटिक इ. मूल्यवान खडे आहेत. उत्खननात उपलब्ध झालेल्या बांगड्या हस्तिदंती, शंखाच्या आणि विशेषत्वे तांब्याच्या आहेत.
सातवाहनांच्या भरभराटीच्या काळात मातीच्या भांड्यांचे असंख्य प्रकार आढळतात. रोमन मद्यकुंभ, रेड पॉलिश वेअर व मेगॅरियन वेअरसारख्या भांड्यांचे अवशेष रोम देशाशी असलेले सांस्कृतिक तसेच व्यापारी संबंध अधोरेखित करतात. विविध धातूंची सु. ४०० नाणी, निम-मौल्यवान पाषाणांपासून घडवलेले १००० मणी, असंख्य अर्चनाकुंडे, कानातील अलंकार, शंखाच्या बांगड्या, बौद्धधर्माशी निगडित प्रतीके असलेले दगडी पाटे मिळतात. यांव्यतिरिक्त काही धान्यांचे नमुने आढळले आहेत. यावरून तत्कालीन आर्थिक परिस्थितीची कल्पना करता येते. येथील अवशेषांत सु. सातशे पक्वमृदा वस्तू मिळाल्या. त्यांपैकी मानवप्राणी व पशू यांची शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इतर वस्तूंत कर्णभूषणे, पूजेची अर्चनाकुंडे व घरगुती वापरातील हस्तिदंती कंगवे, कज्जलशलाका (काजळाच्या डब्या), सोंगट्या, थाळ्या इत्यादींचा समावेश होतो. कर्णभूषणे डाळिंबीच्या फुलांसारखी कलाकुसर केलेली असून भारतात अन्यत्र उपलब्ध न झालेले किन्नरी-पात्र, शिवाय एका झाकणावरील तीन स्त्रियांच्या उर्ध्वांगाची मूठ इ. अवशेष लक्षणीय आहेत.
भोकरदन उत्खननातील सर्वांत उल्लेखनीय वस्तू म्हणजे अप्रतिम हस्तिदंताची स्त्री-प्रतिमा कोरलेली आरशाची मूठ. ही प्रसाधन या वर्गात मोडणारी वस्तू प्रथमच स्तरनिबद्ध संदर्भासह अवगत झाल्याने तिचा काळ निश्चितपणे सांगता आला. त्याचप्रमाणे भोकरदन हे हस्तिदंतकलेचे एक केंद्र होते, असे अनुमानही करता आले. येथील मानवी शिल्पांतील दोन स्त्री-प्रतिमांपैकी एक इटलीमधील पाँपेई या ठिकाणी १९३०-३१ साली झालेल्या उत्खननात मिळालेल्या स्त्री-प्रतिमेसदृश आहे. दोन दासींच्या मधोमध उभी असलेली ही स्त्री सडपातळ व बांधेसूद आहे. हिचा काळ इ. स. पू. पहिले ते इसवी सनाचे पहिले शतक असावा. सातवाहन काळात भोकरदन हे हस्तिदंती कलावस्तूंचे केंद्र असावे आणि येथील वस्तूंची व्यापारानिमित्त देवाण-घेवाण होत असावी, असे अनुमान केले जाते. त्यामुळे पाँपेई येथे उपलब्ध झालेली स्त्री-प्रतिमा मूळची याच भागातली असावी, असेही म्हणता येईल. यांशिवाय येथील उत्खननात मातृकादेवींच्या दोन शिलामूर्ती मिळाल्या. त्या दोन्ही मूर्ती विशीर्ष असून योनिस्तनयुक्त उत्तानपाद मूर्ती आहेत. त्यांपैकी एका मूर्तीच्या दोन्ही बाजूंस कमळे कोरलेली आहेत. तज्ञांच्या मते त्या इ. स. पाचव्या-सहाव्या शतकांत खोदल्या असाव्यात.
सातवाहन काळात भोकरदन विविध कलाकुसरीचे तसेच विविध उद्योगधंद्यांचे केंद्र होते, सातवाहन सत्तेच्या अवनतीनंतर पैठणप्रमाणेच या गावाचा रोमशी व्यापार मंदावला असावा आणि हळूहळू त्याचे ऐश्वर्य आणि महत्त्व कमी झाले असावे. पुढे मध्ययुगात या नगरीला थोडे महत्त्व लाभले होते. इसवी सनाच्या आठव्या शतकात येथे शैवपंथीयाचा प्रभाव होता, असे शेजारी असलेल्या शैलगृहावरून सांगता येते. मध्ययुगीन काळात येथे पुन्हा वसाहत झाली.
इसवी सनाच्या आठव्या–नवव्या शतकांच्या सुमारास केळना नदीच्या काठांवर कोरलेल्या सात खोल्या आणि सभागृहयुक्त एक शैव लेणे इथे आहे तथापि त्यानंतरचा या गावाचा इतिहास ज्ञात नाही. उत्तर पेशावाईत हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत आले. भोकरदनच्या सभोवती प्राचीन तटबंदीचे अवशेष असून जुन्या किल्ल्यात तहसील कार्यालय आहे. गावात जुनी आठ लहान मंदिरे असून त्यांपैकी खंडोबाचे मंदिर मोठे आहे. तेथे प्रतिवर्षी यात्रा भरते. याशिवाय नदीकाठी एक महानुभव पंथाचे प्राचीन मंदिर आहे. दर शनिवारी येथे बाजार भरतो. भोकरदन कांबळी व खंडसरी साखरेसाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.
भोकरदन लेणी, भोकरदन, जालना,
भोकरदन लेणी ही केळना नदीच्या डाव्या तीरावर वसलेली आहे. भोकरदन हे प्राचीन भोगवर्धन होय. पुराणांमध्ये विदर्भासह इतर जनपदाचा उल्लेख आढळतो. त्यापैकी भोगवर्धनचा उल्लेख सुरवातीच्या काही प्राचीन ब्राम्ही शिलालेखांमध्ये देखील आढळतो त्यानुसार येथील रहिवाशी
धार्मिक प्रवृत्तीचे, दानकर्ते आणि तत्वज्ञानी होते. प्राचीन भोगवर्धनमध्ये दक्षिणेतील विद्वानाचे वास्तव्य होते. त्यामुळे भोगवर्धनचे महत्व वाढले होते.
भोकरदन येथे दुहेरी दालनाच्या लेणी असुन त्यात मागे सहा खोल्या आहेत. मंडपातील स्तंभ सपाट असुन भक्कम आहेत. त्यातील एका स्तंभावर ९ व्या शतकातील दिसून येणाऱ्या लिपीतील शिलालेख आहे. गर्भगृहांच्या द्वारशाखेवर, स्तंभावर आणि उजव्या व डाव्या भिंतीवर काही शिल्पकाम आहे. गर्भगृहासमोर द्वारपाल आहेत. गर्भगृहाच्या आत योनीसारखा आराखडा आहे. त्यामुळे ही लेणी शैवपंथीयांना अर्पण केली असावी. भोकरदन येथील लेणी उत्खननशैली वरुन त्या पुर्वी चालुक्य कालीन असाव्यात असे वाटते. भोकरदन लेणी हे स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात
पुरातत्व खात्याने या ठिकाणी नवीन माहितीचे फलक लावले आहे त्यात सात खोल्याऐवजी सहाखोल्यांचा उल्लेख करण्यात आल्याने पुरातत्व विभाग या लेणी संदर्भात किती दक्ष आहे हे सिद्ध होते.
शहराजवळील ऐतिहासिक लेणी हे स्मारक महाराष्टÑ प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून या स्मारकाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या लेणी मधील अप्रतिम व मौल्यवान शिल्पे सततच्या पावसाने नष्ट होत आहेत. किंबहुना पावसाच्या पाण्याने या लेणीमधील नवव्या शतकातील शिलालेखही गायब झाला आहे. भोकरदन पूर्वी प्राचीन काळात भोगवर्धन म्हणून परिचित असले तरी भोगवर्धनचा उल्लेख सुरवातीच्या काही प्राचीन ब्राम्ही शिलालेखांमध्ये आढळतो. त्यानुसार येथील रहिवासी धार्मिक प्रवृत्तीचे, दानकर्ते व तत्त्वज्ञानी असल्याचे सिद्ध होते. दुहेरी दालनाच्या या लेणी असून त्यामागे सात खोल्या आहेत. लेणीमधील मंडपातील स्तंभ सपाट असून ते भक्कम होते, परंतु गेल्या काही वर्षात या स्तंभावरील मौल्यवान शिल्पे नष्ट झाली आहेत. उजव्या व डाव्या भिंतीवरील पूर्ण व जुन्या काळातील शिल्पकाम खराब झाल्याचे या ठिकाणी दिसत आहे. दरम्यान लेणीमधील सर्व शिल्पकला ज्या पद्धतीने जोपासली व काळजीने जपायला पाहिजे होती, त्या पद्धतीच्या उलट दुर्लक्ष झाल्याने ही लेणी होती का नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेणीमधील सर्वच भिंतीवरील शिल्प सततच्या पावसाने जीर्ण झाले असून ते खराब झाले आहे. सध्या लेणीमधील सात खोल्या पावसाने गळत असून त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. लेणीसमोरील भागात मोठ्या प्रमाणावर पाणी असून शेवाळ तयार झाले आहे.
इ.स.१९८० पुर्वी प्रकाशित झालेल्या अनेक कागदपत्रात जुन्या शहराभोवती उध्वस्त तटबंदी असल्याचे उल्लेख येतात पण आता म्हणजे २०२३ साली या शहराची शोध भटकंती केली असता कोठेही कोटाचे अवशेष दिसुन येत नाही. जुन्या भोकरदन शहरात लाल गढी म्हणुन ओळखली जाणारी एक निजामकालीन गढी पहायला मिळते. मराठवाड्याचा हा भाग हैद्राबाद निजामाच्या ताब्यात असल्याने भारत स्वतंत्र होईपर्यंत या गढीचा वापर आसपासच्या गावामधील सारा जमा करण्यासाठी केला जात असे. सध्या या गढीत नंदकुमार देशपांडे यांचे वास्तव्य असुन हि गढी निजामकाळात त्यांच्या पूर्वजांनी लाड यांच्याकडून विकत घेतल्याचे ते सांगतात. लाडांची गढी म्हणुन हि लाड गढी कालांतराने अपभ्रंश होऊन लाल गढी बनली. गढीच्या दर्शनी भागात दरवाजाची नक्षीदार दगडी कमान असुन दोन टोकाला दोन षटकोनी बुरुज आहेत. या दोन्ही बुरुजाचा खालील भाग घडीव दगडात बांधलेला असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. यातील एक बुरुज अर्धवट ढासळलेला आहे. गढीचा आतील परिसर साधारण अर्धा एकर असुन आत एक दुमजली वाडा आहे. हि व्यापाऱ्याने आपली खाजगी वापरासाठी बांधलेली गढी असुन गढीला कोणत्याही प्रकारचा इतिहास नाही.
गढी पहाण्यास १० मिनिटे पुरेसी होतात. भोकरदन हे ठिकाण उज्जैन ते पैठण या व्यापारी मार्गावर वसले होते. प्राचीन वाङ्मयात तसेच मार्कंडेय पुराणांत व अनेक शिलालेखात याचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळी हे जनपद होते आणि नंतर त्याला विषयाचा म्हणजे प्रांताचा दर्जा प्राप्त झाला. भोगवर्धन येथील रहिवाशांनी सांची व भारहूत येथील स्तूपांच्या बांधणीस दान दिल्याचे उल्लेख तेथील शिलालेखात आढळतात. माहिष्मतीचा कलचुरी राजा शंकरगण याने भोगवर्धन विषयातील एका गावातील जमीन ब्राह्मणाला दान दिल्याचा उल्लेख एका शिलालेखात येतो. इसवी सनाच्या आठव्या–नवव्या शतकांच्या सुमारास खेळणा नदीच्या काठांवर कोरलेल्या सात खोल्या आणि सभागृहयुक्त एक शैव लेणे इथे आहे पण त्यानंतर मात्र या गावाचा इतिहास अज्ञात आहे. शां. भा. देव आणि र. शं. गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली १९७३-७४ साली येथे उत्खनन करण्यात आले. त्यांत सातवाहनपुर्व, सातवाहन कालीन आणि सातवाहनोत्तरकालीन अनेक वस्त्यांचे अवशेष आढळले. उत्तरसातवाहन काळातील भारताचा रोमन संस्कृतीशी असलेल्या व्यापारामुळे भोकरदनची भरभराट झाली. सातवाहन काळात हे शहर प्राचीन व्यापारी मार्गावर होते व उज्जैन आणि पैठण या तत्कालीन महत्त्वपूर्ण शहरांशी तसेच जुन्नर, कार्ले, कान्हेरी, कल्याण इत्यादी शहरांशी जोडले गेले होते. सातवाहन सत्तेच्या अस्तानंतर पैठणप्रमाणेच या गावाचा रोमशी व्यापार मंदावला असावा आणि हळूहळू त्याचे ऐश्वर्य आणि महत्त्व कमी झाले असावे. पुढे मध्ययुगीन काळात या शहराला पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले. पेशवाईच्या काळात मराठवाडा निजामाच्या ताब्यात असल्याने भोकरदन हे गाव हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत होते.
केळनेतीरीच्या खोदीव लेण्यापासून, मुख्य वस्तीपासून काही अंतरावर यादवकालीन रामेश्वर मंदिर आहे. आज तिथे चक्रधर स्वामींचा ओटा आहे म्हणून महानुभाव मठ आहे व श्रीकृष्ण मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात यादवकालीन अवशेष विखुरले आहेत. मंदिर पूजेत असल्यामुळे मंदिराची मोठ्या प्रमाणात डागडुजी झाली आहे व जागेत बदल केल्यामुळे मूळचे स्वरूप समजणे जरा कठीण झाले आहे. मंदिर उंच पिठावर बांधले आहे. पायऱ्यांवर मध्ययुगीन नक्षीकाम आहे. दर्शनी भागी दोन ते तीन फूट उंचीची भिंत आज शिल्लक आहे.
मंदिराची मुख्य द्वारशाखा आकर्षक असल्यामुळे लक्ष वेधून घेते. पंचशाखा द्वारशाखेवर रत्न व स्तंभ शाखा ठळक असून, इतर शाखा साध्या आहेत. मंदिराला ललाटबिंब व वरचे शिल्पकाम शिल्लक नाही. सभामंडप बंद होता की अर्धखुला, याची आज कल्पना करता येत नाही. शिखराचा कुठलाच भाग आज शिल्लक नाही. सभामंडप चौकोनी असून पंचरथ आहे. खुर, कणी, कुंभ असे नक्षीविरहित थर आहेत. त्यातील कुंभ भागावर रत्नांची पट्टी सर्व मंदिराभोवती फिरते. सभामंडपाच्या भिंती आधुनिक असल्या तरी मधल्या जागेतील चतुष्की अजून अबाधित आहे. मधला स्तंभ मध्यावर आणि स्तंभांच्या तळाशी अप्रतिम शिल्प केले आहे. नागशीर्ष असलेले स्तंभ वरपासून वर्तुळाकार, चौरस, अष्टकोनी, चौरस अशा विविध आकाराच्या आडव्या छेदाचे आहेत. स्तंभ तळावरील मूर्तींमध्ये विविध सूरसुंदरी व अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. बहुतांशी मूर्तींच्या हातात म्हाळुंग दिसते.
महिषासुरमर्दिनी रेड्याचे शीर कापून बाहेर पडणाऱ्या महिषासुर दैत्याशी भाल्याने लढताना दाखविली आहे. एका स्तंभावर चामुंडा व खटवांग त्रिशूळ घेतलेला भैरव नृत्य मुद्रेत दाखवले आहेत. वाली सुग्रीवाच्या द्वंद्वाचे प्रभावी शिल्पांकन दोन तीन स्तंभ चौकटीत केले आहे. तर बाजूच्या चौकटीत राम लक्ष्मणाबरोबर उभा असून, बाण मारताना दाखवला आहे. काही दृश्यांमध्ये वानरांचे राक्षसाशी युद्ध दाखवले आहे. राम व लक्ष्मणाच्या हातात पुरुषभर उंचीचे धनुष्य कोरले आहेत व हातात बाणांचा जुडगा दिसतो. रामायणातील रामाद्वारे सुवर्णमृग रूपातील मारिच वधाचे अंकन ही प्रभावी आहे. नृत्यमग्न सुंदरी, वादक, वानर सभा अशी आणखी काही दृश्ये कोरली आहेत. बलशाली भीम, एका हाताने हत्तीचा पाय धरून भिरकावतानाचे महाभारतातील प्रसंग इथे कोरला आहे. विविध केशभूषा असलेल्या मनुष्यांची ढाल, तलवार व भाल्यांची लढाई उत्कृष्ट कोरली आहे. सभामंडपात चक्रधर स्वामींचा ओटा आहे व गाभाऱ्याच्या जागेत स्वामींचे पाषाण आणि श्रीकृष्णाची आधुनिक मूर्ती पूजल्या आहेत.
भोकरदनला दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून वैष्णव देवता, तसेच लज्जागौरी स्वरुपातील देवीची पूजा प्रचलित होती, असे दिसते. तसेच, सहाव्या शतकातील वैष्णव लेण्यामध्ये, शेषशायी विष्णू, मदन, बलरामांची शिल्पे कोरलेली आढळतात. तेराव्या शतकातील रामेश्वर मंदिरातही द्वारपाल वैष्णव आहेत. तसेच मंदिरावर रामायण महाभारतातील प्रसंग कोरले आहेत. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींचा ह्या भागात खूप संचार असे व ते बऱ्याचदा अशा मंदिरांमध्ये आसरा घेताना दिसतात. वैष्णव मंदिरात मुक्काम करणे तर अधिकच संयुक्तिक वाटते. मधल्या संक्रमणाच्या काळात मूळ मंदिराचा विध्वंस झालेला आहे. किंबहुना ह्या भागाचे आधीचे नाव बेचिराग आहे, असे ऐतिहासिक नोंदींवरून समजते. ह्या धामधुमीच्या काळातही इथल्या कृष्णासंबंधित पौराणिक संदर्भ जिवंत राहिले, तसेच महानुभाव संप्रदायाने चक्रधर स्वामींचे ठिकाण ओळखून त्याचा जीर्णोद्धार केला. एकापरीने अनेक स्थित्यंतरांमधूनही वैष्णव केंद्र असलेल्या भोगवर्धनाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व ढळले नाही, ही विलक्षण गोष्ट आहे. आज मात्र, भोगवर्धनाच्या गतवैभवाची नव्याने ओळख करून त्याच्या संवर्धनासाठी आवश्यकता आहे!
संदर्भ :-
१ ) https://mr.wikipedia.org/s/e8a
२ ) maharashtratimes.com
३ ) https://vishwakosh.marathi.gov.in/28229/
४ ) https://enrouteindianhistory-com
५ ) Deo, S.B. & Gupte, R.S. Excavations at Bhokardan (Bhogvardhan): 1973, Nagpur University, Nagpur, 1974.
६ ) Deotate, B.C., Joshi, P.S. & Parchure, C.N. Glimpses of Ancient Maharashtra, Bharatiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
७ ) bolbhidu.com
८ ) https://www.lokmat.com/blog/chhatrapati-sambhajinagar/rameshwar-temple-yadavam-ancient-bhogvardhan/
९ ) divyamarathi.bhaskar.com
१० ) https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/2023/07/blog-post.html
११ ) https://bharatkalyan97.blogspot.com/2020/11/bhokardan-maharashtra-or-bhogavardhana.html?view=flipcard
१ ) https://mr.wikipedia.org/s/e8a
२ ) maharashtratimes.com
३ ) https://vishwakosh.marathi.gov.in/28229/
४ ) https://enrouteindianhistory-com
५ ) Deo, S.B. & Gupte, R.S. Excavations at Bhokardan (Bhogvardhan): 1973, Nagpur University, Nagpur, 1974.
६ ) Deotate, B.C., Joshi, P.S. & Parchure, C.N. Glimpses of Ancient Maharashtra, Bharatiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
७ ) bolbhidu.com
८ ) https://www.lokmat.com/blog/chhatrapati-sambhajinagar/rameshwar-temple-yadavam-ancient-bhogvardhan/
९ ) divyamarathi.bhaskar.com
१० ) https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/2023/07/blog-post.html
११ ) https://bharatkalyan97.blogspot.com/2020/11/bhokardan-maharashtra-or-bhogavardhana.html?view=flipcard
https://www.youtube.com/watch?v=OQNOAaYkKpQ
सोमण खानावळी पलीकडचे नृसिंहवाडी..
साधे सात्विक जेवायला सोमण decent option in Nrusinhawadi commonly known as Narsobawadi or Narsobachi Wadi..कोणीही तेच suggest करते.
But for me असे छोटे मोठे हॉटेल स्टॉल are always preffered then a single meal ते ही गर्दीत लाइन लाऊन खाण्यापेक्षा..
My Take on Food Scenes There
1) Narsobachi wadi basundi :- 6/10
Not must try
2) New Royal cafe :-
Vadapav:- 8.5/10
Tomato Omlette:-8/10
Tea:-8.5/10
Must try
3) G. m lanjekar :-
Pedhe kalanad:-6/10
Not must try
4) Sambha bhel :-
Bhel :-8/10
Panipuri:-6/10
Can Try
5) Anna Buddhe :-
Pedhe :-8.5/10
Kalakand:-7/10
Must Try for pedhe
6) Arun Patil :-
Aakha Tez masoor:-8.5/10
Double fry rice:-9/10
Must Try
7) Gadkari Farsan :-
7/10
Can try
8.5/10
Must Try.
एकूण काय सांगली खाद्यसंस्कृती साठी अतिशय चांगली!
All Addresses can be found on Gmaps.




































No comments:
Post a Comment