पैठण हे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) जिल्ह्यातील एक प्राचीन व पवित्र नगर आहे. पैठण तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. छत्रपती संभाजीनगरपासून ५० किलोमीटर अंतरावर हे तालुक्याचे ठिकाण असून दक्षिणगंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर ते वसले आहे. प्राचीन काळापासून दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या या शहराचे पूर्वीचे नाव “प्रतिष्ठान“असे होते आणि ही पूर्वी सातवाहन राजाची राजधानी होती तर ब्रिटिश काळात हे शहर हैदराबाद संस्थानात मोडत होते. तसेच पैठण हे संस्कृत भाषेचे व्यासपीठ होते. त्या काळापासून ते आत्तापर्यंत संस्कृत आणि धर्मशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या इथल्या पंडितांनी दिलेला धर्मनिर्णय अखेरचा निर्णय मानला जातो. पैठणचा उल्लेख इ.स.पू. ४०० च्या सुमारास बौद्ध धर्मग्रंथातून आढळतात. सुप्तनिपात, अगुत्तरानुकाय, चुल्लकलिंग जातक इत्यादी ग्रंथांवरून अश्मक व मूलकांचा देश म्हणजे आजकालचे नगर, बीड आणि औरंगाबाद हे जिल्हे एकमेकालगत पैठण हे राजधानीचे शहर होते.अशोकाच्या शिलालेखात (इ.स.पू. २७) पेतनिकाचा उल्लेख आढळतात. कन्नड तालुक्यात पितळ खोऱ्यातील बौद्ध लेण्यातून (इ.स.पू. २००) गंधित कुळातील मित्रदेवाने आणि संगत नावाच्या इसमाने दान दिल्याचे उल्लेख आहेत. सोयीच्या स्तुपातूनही प्रतिष्ठाणच्या रहिवासाचे उल्लेख आहेत.इ.स.पू. ६० च्या सुमारास परिप्लस या इजिप्त मधील ग्रीक प्रवाशाने पैठण हे भरभराटीचे शहर भडोचहून २० दिवसांच्या टप्प्यावर असून येथे विविध प्रकारचे कापड तयार होतात असं नमूद करून ठेवलंय. पैठणचा प्राचीन उल्लेख प्रज्ञपुराणात येतो.याचे प्रतिष्ठान, पोतली, पइठ्ठान, पट्टण, पोयणपुर इ. नामोल्लेख प्राचीन साहित्यांत आढळतात. अशोकाचा शिलालेख व सांचिस्तूप यांत येथील रहिवाशांचा अनुक्रमे पेतनिक व पैठणिक म्हणून उल्लेख केला आहे. पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या ग्रंथातही पैठणच्या सुबत्तेविषयी तसेच व्यापारासंबंधी अनेक उल्लेख आढळतात.

प्रतिष्ठाण नगरीला म्हणजेच पैठणला सुवर्णकाळ लाभला तो सातवाहनांच्या काळात, पैठण ही तत्कालीन सातवाहनांची राजधानी होती. त्या काळी सातवाहनांचा परकीय देशांशी व्यापार चालत होता हे सातवाहनांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते.कला, संस्कृती, पांडित्य, साहित्य, व्यापार या क्षेत्रात पैठणची भरभराट सातवाहनांच्या काळात झाली.सातवाहन कुळातील गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात शालिवाहन हा सर्वात कर्तबगार राजा या भूमीत होऊन गेला. सातवाहन राजांसंबंधी अनेक दंतकथा स्थानिकांमध्ये प्रचलित आहेत.
डॉ. मोरवंचीकर यांनी सातवाहन काळाचं वर्णन केलं. ते म्हणाले, "या सातवाहनांची पैठण ही राजधानी होती. त्या वेळी पैठणला प्रतिष्ठान नगरी म्हटलं जायचं."
"त्याकाळात पैठण एवढं मोठं शहर दुसरं नव्हतं. ते जगातल्या त्या काळच्या सर्व मोठ्या बाजारपेठांशी जोडलेलं होतं. पैठणमधून रोमशी थेट व्यापार चालायचा आणि याचे पुरावे इतिहासतज्ज्ञांना मिळालेले आहेत. पैठणजवळच्या उत्खननात रोमन नाणी मिळाली आहे," ते सांगतात.
"तत्कालीन भारतात व्यापार मार्गांना सार्थवाह पथ असं म्हणायचे. हे सर्व सार्थवाह पथ पैठणमधून जात होते. पैठण हा त्याकाळी मोठा व्यापारी थांबा होता. बहूतांश व्यापारी हे महिनोंमहिने मुक्कामी राहत असतं. याचं वर्णन हाल सातवाहन याच्या गाथेमध्ये केलं आहे. त्यातील सातशे पदांपैकी चारशे पदं ही व्यापारावर आहेत."

समृद्ध पैठण शहरात त्यावेळेस प्राकृत, संस्कृत, वाड्ग्मय ही अगदी भरात होते. त्यात गुणाढ्याच्या बृहतकथा, सातवाहन राजा हाल यांने संपादित केलेल्या चारोळ्यांचा संकलन म्हणजेच गाहासप्तसई ( कवी राजा बढे यांनी गाहासतसईचा मराठी गद्य -पद्य अनुवाद 'शेफालीका' या नावाने अतिशय सुंदर भाषेत प्रसिद्ध केला आहे )
याच राजवटीच्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाचं नाव दालन उघडलं गेलं आणि महाराष्ट्राला स्थैर्य देऊन त्यांनी आर्थिक सुबत्तेचं गौरीशिखर गाठलं सातवाहनांनी दिलेल्या राजकीय स्थैर्यामुळं, संरक्षणामुळं या काळात तेर नि पैठण या परिसरात शेतीचं उत्पादन प्रचंड वाढले.
त्यातून व्यापार आणि उद्योग वाढून या व्यापारातून रोम, अथेन्स, कैरो, इस्तंबूल सारख्या प्राचीन शहरांशी-बाजारपेठांशी संपर्क निर्माण झाला. सुती आणि रेशमी कपड्याच्या निर्यातीतून प्राचीन आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा प्रचंड दबदबा निर्माण झाला आणि या वस्त्रांच्या निर्यातीतून अगणित परकीय संपत्ती भारतात त्या वेळी मिळू लागली. तेव्हापासून आजही पैठणची पैठणी जगातील अनेकांना भुरळ पाडत आहे, ही अभिमानाची बाब आहे. रोमसोबत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं सातवाहन राज्यात रोममध्ये तयार होत असलेलं मद्य उपलब्ध होत होतं. अशा मद्यकुंभाचे पुरावे पैठण येथील उत्खननात सापडले आहेत.
भारताचे त्या काळातील रोमसोबत सुरू असलेल्या तत्कालीन व्यापारी मार्गावरील पैठण हे एक महत्त्वाचं ठिकाण होतं. ‘सुत्तनिपात’ या ग्रंथामध्ये आलेल्या उल्लेखानुसार, बावरी नामक उत्तर भारतातील एक तपस्वी अश्मक देशात येऊन वास्तव्य करू लागला. हा प्रदेश गोदावरी नदीच्या किनारी होता. जेव्हा हा तपस्वी उत्तर भारतात परतीसाठी निघाला, तेव्हा त्यानं मुक्काम केलेलं पहिलं ठिकाण म्हणजे ‘ प्रतिष्ठान ’ म्हणजे आजचं पैठण.
म्हणजे महाजनपदांच्या कालखंडापासून पैठणचं अस्तित्व आणि महत्त्व आपल्याला लिखित स्वरूपात दिसून येतं. हा प्रदेश अतिशय संपन्न आणि महत्त्वाचा होता, असे उल्लेख या ग्रंथामधल्या वर्णनांमधून आढळून येतात. जैन साधनांमध्ये सुद्धा पैठणचे वारंवार उल्लेख दिसतात. बृहत् कल्पभाष्य, वसुदेवहिंडी, पिंडनिर्युक्ति, गच्छाचारवृत्ती, कल्पसूत्र अशा इसवी सन पूर्व दुसरे ते इसवी सनाचे चौथे पाचवे शतक या काळात रचण्यात आलेल्या जैन ग्रंथांमध्ये पैठणचा उल्लेख आलेला आहे.
सातवाहनकालीन भारताच्या नकाशात पैठण अर्थात प्रतिष्ठाणचे स्थान
सातवाहन कालखंडाच्या या साडेचारशे वर्षांच्या काळात जे व्यापारीमार्ग तयार झाले त्या मार्गांवर लेणी कोरली गेली.१२०० पैकी ९०० लेणी याच मार्गांवर आढळतात. पश्चिम किनारपट्टीवर व्यापारी बंदरं होती. तिथे मोठी शहरं उदयास आली. याच काळात इंडो-रोमन व्यापार भरभराटीस आला. दुर्दैवानं आपला इतिहास उत्तर भारतावर केंद्रित आहे. गुप्त साम्राज्यापेक्षाही सातवाहनांचं साम्राज्य मोठं होतं. कार्ले, भाजे, नाशिक, जुन्नर, पितळखोरा, वेरुळच्या लेण्यांमध्ये सातवाहन राजांचा उल्लेख आढळतो. आर्थिक संपन्नता आणि राजकीय स्वास्थ्य या काळात लाभलं आहे. या काळात दक्षिण भारतातल्या समुद्र किनाऱ्यावरून आपले व्यापारी आग्नेय आशियात जात असत. तिथून मसाल्याचे पदार्थ भरून आणत, भारतातील पैठणचं कापड, रेशीम, हस्तिदंताच्या वस्तू, चंदन, मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जात. युरोपात पैठण आणि तगरपूरच्या (तेर) कापडाला मोठी मागणी होती. गुजरातमधल्या भ्रुभू कच्छसह (भडोच) महाराष्ट्रातील कलीना (कल्याण), सुरपारक (सोपारा), स्थानक (ठाणे), दाभोळ, जयगड, देवगड, मालवण अशा सगळ्या बंदरांवरून समुद्री व्यापार चालत असे.

सातवाहन काळात तेर आणि पैठण इथे हीनयान पंथीय बौद्ध धर्मीयांची संख्या प्रचंड मोठी होती आणि राष्ट्रातील बहुसंख्य व्यापार हा बौद्धांच्या हाती होता. या बौद्ध व कांही जैन व्यापाऱ्यांच्या दान आणि सेवा कार्यातून व्यापारी मार्गावर महाराष्ट्रात अनेक बौद्ध स्तूप, चैत्यगृहं आणि विहार बांधण्यात आले. तेर येथील त्रिविक्रम मंदिर म्हणजे सातवाहनकालीन बौद्ध धर्मीयांच्या विटाच्या बांधकामातील चैत्यगृहाचे रूप म्हणावे लागेल. शिवाय पैठण परिसरात देखील अनेक स्तूप आणि चैत्यगृह या काळात बांधण्यात आली, ज्याचे अवशेष आज उद्ध्वस्त रूपात आढळून येतात.
परकीय प्रवाशांच्या वृत्तामध्ये सातवाहन राज्यातील बरीच शहरं ही तटबंदीयुक्त होती. त्यापैकी एक पैठण असायला हवं, असा वासुदेव मिराशी आदी अभ्यासकांचा अंदाज आहे. पैठण इथं झालेल्या उत्खननात सातवाहन राजांची नाणी, मणी, विविध प्रकारची खेळणी, घरांचे अवशेष, सांडपाणी निचरा करण्यासाठी निर्माण केलेली उत्कृष्ट व्यवस्था अशा बऱ्याच गोष्टी उजेडात आल्या.

सातवाहन राजांनंतर पैठण शहराला यादवांच्या काळात वैभवशाली दिवस पाहायला मिळाले. कलचुरी, राष्ट्रकूट वगैरे राजांच्या काळात पैठणचं अस्तित्व होतं, पण त्या शहराला सर्वच क्षेत्रात पुढारलेपण प्राप्त झालं यादव कालखंडात. धार्मिकदृष्ट्या पैठणला दक्षिण काशीचं महत्त्व प्राप्त झाले, तर कलेमध्ये पैठण येथील कारागिरांनी देशामध्ये लौकिक मिळवला. रेशीम आणि जरीपासून निर्माण करण्यात येणाऱ्या वस्त्रांची अफाट विक्री होण्यास सुरुवात झाली. पैठणमध्ये चांगले काष्ठकामही होत असे. जेम्स बर्जेसने अशा काष्ठकामाची सु. १५ छायाचित्रे आपल्या अर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या तिसऱ्या खंडात दिली आहेत.
टॉलेमी (इ.स. ९०–१६९), मार्को पोलो (१२५४–१३२४), इब्न बतूता (१३०४–७८) यांसारख्या प्रवाशांनी सुद्धा पैठणच्या वीणकामाची मुक्तकंठाने स्तुती केलेली आपल्याला दिसून येते. या कारागिरांची ख्याती अगदी गुजरात आणि तिथल्या अणहिल्लपट्टनच्या राजानं पैठण शहरावर स्वारी केली, शहर लुटले आणि परत जाताना शहरातील रेशीम काम करणाऱ्या कारागिरांच्या कुटुंबाला आपल्यासोबत गुजरातला नेलं, शेती - संपत्ती वगैरे देऊन तिथंच स्थायिक केले.विद्याक्षेत्रात पैठण येथील शास्त्रीमंडळी ख्यातनाम झाली होती. सर्वच बाबतीत पैठण अग्रेसर ठरलं.
मात्र पुढे वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट या वंशांच्या काळात पैठणकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर यादवकालात या नगराचे महत्त्व धर्मपीठ म्हणून वाढले. दक्षिण काशी म्हणूनही त्याचा उल्लेख पुढे होऊ लागला. यादवांनंतर पैठणवर बहमनी, मोगल, निजामशाही, मराठे व पुन्हा निजामशाही यांचे आधिपत्य होते. ब्रिटिश अंमलात ते हैदराबाद संस्थानच्या अखत्यारीत होते.

महाराष्ट्राच्या इतिहासात पैठणने अनन्यसाधारण भर घातली आहे. येथे हैदराबाद संस्थानच्या पुरातत्त्वविभागाने १९४३ मध्ये आणि महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागाने १९ ६६–६७ मध्ये उत्खनने केली.सर्वप्रथम उत्खनन करण्यासाठी निजामाच्या अखत्यारीत असलेल्या पुरातत्त्व खात्यानं पुढाकार घेतला. या उत्खननात चौथ्या-पाचव्या शतकात विटांपासून निर्माण करण्यात आलेल्या मंदिरांचे अवशेष प्राप्त झाले. मोरेश्वर दीक्षित, रामचंद्र मोरवंचीकर, डॉ. अरविंद जामखेडकर, के. व्ही. कावडकर यांसारख्या पुरातत्त्व अभ्यासकांनी पैठण नगरीत उत्खनन केले. या उत्खननांत अश्मयुगीन हत्यारे व जनावरांची अश्मीभूत हाडे सापडली. त्यामुळे अश्मयुगापासून येथे मानवी वस्ती असावी, असा पुरातत्त्ववेत्यांचा कयास आहे.सुरुवातीच्या काळात करण्यात आलेल्या उत्खननामधून पैठण परिसरात ताम्रपाषाण युगापासून मानवी वस्ती असावी, असा अंदाज होता. काही ठिकाणी अश्मयुगीन कालखंडाशी नातं दर्शवणारी दगडी हत्यारं सुद्धा उपलब्ध झाली आहेत. पैठणच्या प्राचीन इतिहासाशी नातं सांगणाऱ्या पांढऱ्या मातीच्या काही टेकड्यांमध्ये हे उत्खनन करण्यात आलं. पैठण येथे नदीकिनारी असलेली काळी माती तपासली असता, अभ्यासकांना त्यामध्ये जोर्वे संस्कृतीशी साधर्म्य दाखवणाऱ्या मातीच्या भांड्याचे अवशेष प्राप्त झाले. पैठणच्या उत्तरेला गुळगुळीत अशा दगडी कुऱ्हाड प्राप्त झाल्या. यावरून ताम्रपाषाण कालखंडाशी पैठणचा असलेला संबंध स्पष्ट झाल्याचा युक्तिवाद अभ्यासकांनी केला आहे.नंतरच्या काही अवशेषांवरून ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इ. स. पू. १५०० दरम्यान नांदत असावी तथापि सातवाहन कालापासून पैठणचा जेवढा इतिहास ज्ञात आहे, तेवढा तत्पूर्वीच्या काळाविषयी नाही. रोमन साम्राज्यांतर्गत प्रदेशांशी पैठणचा व्यापारी संपर्क होता, हे येथे सापडलेल्या रोमन मद्यकुंभांवरून स्पष्ट होते. त्यामुळे तेर,जुन्नर, भोकरदन या शहरांप्रमाणेच पैठणचा व्यापार भरभराटला होता. मद्यकुंभांव्यतिरिक्त सातवाहनकालीन आहत नाणी, मणी, खेळणी, देव-देवतांच्या मृण्मूर्ती, घरांचे अवशेष, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था इ. पैठणचे प्राचीन वैभव दर्शवितात. या अवशेषांतील काही नाणी कापडात बांधून ठेवल्यामुळे त्यावर उमटलेला कापडाचा ठसा आढळून आला. पहिल्या वस्तीचे अवशेष सु. ७ मी. खोलीत मिळाले. ही वस्ती पुराने नष्ट केल्याचा पुरावा आढळला. यानंतरची वस्ती तुघलक-बहमनी काळात झाली. हीही पुराने नष्ट झाली. या काळातील वास्तू मिळाल्या नाहीत मात्र मोगल-ब्रिटिश काळातील नाणी मिळाली.
या प्राचीन काळानंतर संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत कृष्णदयार्णव, संत अमृतराय, चक्रधर स्वामी असे अनेक संत महात्मे आधुनिक काळात याच नगरीत होते. अशा समृद्ध परंपरेनंतर त्या सुवर्णकालीन इतिहासाचे दाखले देत अनेक सुंदर गुढ स्थळे, वाडे, मठ पैठण शहरात आजही आपले रूप सावरत उभे आहेत. पैठणपासून जवळच असणारे मुंगी हे गाव निंबार्कस्वामींचे जन्मगाव. इ.स. १३१२ च्या सुमारास यादवांचं राज्य संपुष्टात येऊन पैठण मोगलांच्या ताब्यात गेलं. त्याकाळी हजारो हिंदुंना धर्मांतरित करण्यात आलं. स्वातंत्रोत्तर काळापर्यंत पैठण निजामांच्या अधिकार क्षेत्रात होतं.

अधुनिक काळात 'नाथसागर जलाशय' ( जायकवाडी धरण ) जगप्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान, श्री बाळासाहेब पाटील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, केंद्र शासन संचलित पैठणी प्रशिक्षण केंद्र, जलविद्युत प्रकल्प अशा अनेक गोष्टींनी आज पैठण शहर एक परिपूर्ण पर्यटन स्थळ झालेले आहे.
राजा सातवाहन (शालिवाहन )
पैठण संदर्भात एक कथा सांगितली जाते. कुंभार परिवारात जन्मलेले राजा शालिवाहन ह्यांना लहान पण पासून घोडे, हत्ती, सैन्य, युद्ध अशे खेळांची आवड होती . सवंगडी सोबत खेळतांना ते माती चे घोडे, हत्ती बनवून युद्ध रंगवायचे. त्या काळी दक्षिण भारतावर सोमकांत राजा चे राज्य होते. राजा सोमकांत व उज्जैनच्या राजा विक्रमादित्य याच्यात नेहमी राज्य विस्तारसाठी घमासान युद्ध होत होते. एका युद्धात राजा विक्रमादित्यने पैठण सैन्याची धूळधाण करत पैठण काबीज केले. तरुण शालिवाहनाने हरलेल्या सैन्य व आपले सवंगडी सोबत घेवून काही काळाने राजा विक्रमादित्यला धूळ चारत प्रतिष्ठान नागरी काबीज केली आणि तद नंतर ४५० वर्ष प्रतिष्ठान नगरीला दक्षिण भारताची राजधानी करत राज्यात शालिवाहन शकची सुरवात केली.
अर्थातच या कथेला काहीही अर्थ नाही.
पैठणच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यावर इथल्या प्राचीन अवशेषांची माहिती घेउया.
पैठण शहरातील पुरातन वाडे हा खरं तर एक संशोधनाचा विषय आहे. इथले वाडे, त्यांचे बांधकाम, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आकार, कोरीव काम, प्रसिद्ध पैठणी दरवाजे, विशेष प्रकारच्या खिडक्या, मोठ्या विटा, पाण्यावर तरंगणार्या विटा, त्यातील नक्षीकाम असं सगळच वेगळं असं वाड्याबद्दल सांगता येईल.
सातवाहनाचा राजवाडा
पैठण शहरात आज जे काही अवशेष आहेत, त्यात सगळ्यात जुना असा सातवाहन राजाचा राजवाडा होय. अर्थात दोन हजार वर्षांपूर्वीच्या बांधकामाचे काही पुरावे आज उपलब्ध नसले तरी लोकप्रवादाने, श्रद्धेने आजच्या गुफा मशिदीलाच सातवाहनांचा राजवाडा संबोधले जाते. एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखा असणार्या या भल्या मोठ्या परिघाच्या या राजवाड्यात काय नव्हते ? पुष्करणी, कारंजे, दालने अर्थात तो होताच राजवाडा !
पैठणला आज जे वाडे वापरात आहेत. त्यातील काही वाडे चक्क ३०० ते ४०० वर्षे जुने आहेत आणि एवढ्या कालावधीनंतरही त्यांची प्रकृती अतिशय ठणठणीत आहे. पैठणमधील जे बहुसंख्य वाडे दिसतात, ते मात्र पेशवाई काळचे. त्याहीपेक्षा जुने असणारे, मात्र अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच आहेत. पैठणला धार्मिक महत्त्व होतेच; पण मोगल, मराठे व पेशवाई काळात विशेष महत्त्व आले ते तलम वस्त्राच्या व्यापारामुळे. या व्यापारातून आलेल्या सुबत्तेतून सावकार निर्माण झाले. मग या सावकारांचे टोलेजंग ऐश्वर्यसंपन्न असे वाडे निर्माण झाले. येथील वाडे आज जरी भग्नावस्थेत असले तरी ते बघण्यासरखे आहेत. अजिंठा लेण्यात असणार्या रंगकामासारखेच रंगकाम येथील वाड्याच्या तळघरात पहायला मिळते. काही वाड्यात केशरमिश्रीत चुन्याच्या भिंती होत्या, त्यातील काही भिंती आजही अस्तित्वात आहेत. येथील एका वाड्यात गुरुत्वाकर्षणावर चालणारे दगडी कारंजे आहे, आज जरी ते बंद असले तरी ते आजही जसेच्यातसे अस्तित्वात आहे.
वाड्यांची रचना
शहरातील बहुतांश वाड्यांचे आरेखन (डिझाईन) सारखेच आहे. मुख्यद्वार, मग कोठा, नंतर मोठा चौक, चौकाच्या तिन्ही बाजूस ओसरी, बैठका, महाले घर (खोली), स्वयंपाकघर, मागे परसदार व याच पद्धतीने वरचा मजला. सर्वसाधारण असे आरेखन या सगळ्या वाड्यांचे आहे. वाड्याच्या बांधकामात चांगल्या दगडांच्या घडीव चिरा-चुन्याचे बांधकाम करून लावण्यात आल्या आहे. समोरचा संपूर्ण भाग म्हणजे वाड्याच्या बाहेरील भिंती या अध्र्या दगडात व विटांमध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. सगळ्या वाड्यांच्या मुख्य प्रवेश दरवाजाच्या ठिकाणी पाणी साठवणुकीचे मोठे घडीव, जमिनीत भिंतीत असणारे मोठमोठे हौद आहेत. प्रवेश दरवाजांच्या वर एका माणसाला ऐसपैस बसता येईल असा कोनाडा आहे. जी रक्षकाची लपण्याची जागा असे. वरच्या कोनाड्यात बसून दरवाजातून येणार्या हल्लेखोर चोरट्यावर वार करता येण्यासाठीची ही जागा.
येथील काही सावकारांच्या वाड्यात तर कल्पकतेची कमाल असे. सावकारी कामकाज करताना आलेली सोन्याची मोड एक प्रतिष्ठित सावकार काम करत करत ती मोड सहजपणे न बघता मागे फेकून देत असे. ती मागे फेकलेली मोड एका देवळीत कोनाड्यातून खाली पडून खालच्या बळदात (तळघरात) जाऊन पडत असे. पैठणमध्ये उभ्या असलेल्या वाड्यांची तळघरे, बळदे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या घडीला अशी अनेक बळदे अनेक गूढ गुपिते आपल्या मिट्ट काळोखात सांभाळत आपले अस्तित्व राखून आहेत.
संपूर्ण वाडा मात्र शंभरनंबरी अशा सागवान लाकडांनी बनवलेला. या सागवान खांबांची उंची नि लांबी बघूनच आजही छाती दडपून जाते. इथल्या सगळ्या वाड्यात भरपूर सागवान वापरले आहे. आणि गंमत म्हणजे पैठणच्या २०० कि.मी. परिसरात मुळी सागवानाचे जंगलच नाही. मग येणारे सागवान हे गुजरातमधील डांगच्या जंगलातून नाशिकला यायचे व तेथून गोदावरीच्या पात्रातून प्रवाहाबरोबर पैठणला येत असत. ही सागवानाची लाकडं वाहून नेणारी एक विशिष्ट जमात आजही पैठणमध्ये आहेच. केवळ गोदावरी किनार्यावरच ही जमात सापडते.
पैठणला या आलेल्या सागवानावर इथल्या कुशल कारागिरांची हत्यारे काम करू लागत. मग ही काष्ठे जिवंत होऊ लागत. पैठणला प्रत्येक वाड्यात सागवानावरचे कोरीव काम दृष्ट लागावे असेच आहे. अनेक प्रकारच्या महिरपी, घट पल्लव, देवदेविका, मोरबांगडी, वेलबुट्टी, प्राणी, देवामध्ये विशेष उल्लेखनीय. गजलक्ष्मी, हत्ती, मोर,सिंह, पोपट इ. शुभ पशूपक्षी झाडांच्या महिरपी, सलदार खांब त्याच्यावर तेवढीच नजर लागावी अशी नक्षी. तेवढीच त्यावरची लकाकी. तळ्याच्या वरच्या मजल्यावरचे विशेष जाळीच्या पक्ष्यांचे कठडे, वैशिष्ट्यपूर्ण नक्षी, लाकडाचे दिवे, लामणदिवा, सागाची सबंध साखळी असे कितीतरी कोरीव काम या लाकडात होत असे. पैठणी दरवाजा व खिडक्या हा एक प्रसिद्ध प्रकार जगातील अनेक संग्रहालयात आजही आहेत. अत्यंत सुंदर लाकडी देवघर ही एक पैठणी वाड्याची ओळख.
संपूर्ण वाडा आखीव रेखीव आहे. इथल्या वाड्यांची ऐसपैस चौक ही एक वेगळी ओळख. नऊचौक, चारचौक, आठ ते पस्तीस चौक असे विविध वाड्यांचे प्रकार इतिहासात होते. बत्तीस चौकांचा वानोळे सावकाराचा वाडा प्रसिद्ध आहे. आजही यातील चार चौकी वाडे पैठणला आहेत. (पाटीलवाडा) पूर्वी तीन एकर परिसरात उभा असलेला धोंडीनाथ महाराज संस्थानचा वाडा आजही जुन्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवत उभा आहे. या वाड्यात गुरुत्वीय तत्त्वावर चालणारे चौकातील पाण्याचे कारंजे तेव्हाच्या तंत्रज्ञानाची साक्षच देतात.
पाण्यावर तरंगणार्या काळ्या रंगाच्या विटांचे गुपितही असेच आहे. या विटेला खंगर म्हणत व ती नक्षीकामासाठी वापरली जात असे. अशी अनेक वैशिष्ट्ये इथल्या भरभक्कम वाड्यांची आहेत, जी जाणून घेताना आश्चर्यचकित होण्याची वेळ येते.
अनेक शतकापासून आपल्या अनोख्या स्थापत्य वैशिष्ट्यांच्या साह्याने उभे असणारे व इतिहासाची काही पाने आपल्यासमोर खुले करणारे पैठण नगरीतील वाडे असेच राहवेत हि अपेक्षा.
तीर्थस्तंभ :-
प्राचीन प्रतिष्ठान नगरीचे वैभव दाखवणाऱ्या शेकडो वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या. मात्र जुन्या पैठण परिसरात एका काळ्या पुर्ण पाषाणात तीर्थस्तंभ आहे. काही अभ्यासकांच्या मते सातवाहन सम्राट पुलोवामी याने दक्षिण भारतावर विजय मिळवला. विजयानंतर प्रतिष्ठानला ( पैठण) राजधानी म्हणून घोषित केले. पैठण येथे दगडाचा कोरीव असा विजयस्तंभ उभारला यालाच तीर्थखांब असे नाव पडले. यानंतर युध्दात विजय मिळाल्यानंतर या ठिकाणी विजयी वीरांचा सत्कार व विजयोत्सव साजरा करण्यात येत असे. म्हणुन याला 'विजयस्तंभ' असेही म्हणतात.
तर काही अभ्यासकांच्या मते सातवाहन राजांनी विक्रमादित्य राजाचा पराभव करून मिळवलेल्या अद्भुत विजयाबद्दल विजयाचं प्रतीक म्हणून पैठण येथील पालथीनगरीत उभारलेला एक विजयस्तंभ आहे. तोच पुढे तीर्थखांब म्हणून प्रसिद्ध झाला.
काही अभ्यासकांच्या मते सम्राट अशोकाचे भारतीय द्विपकल्पाच प्रचंड विस्तारलेल्या साम्राज्याचे दक्षिणेतले मांडलिक सातवाहन होते. इ.स. पूर्व २३२ मध्ये सम्राट अशोकांच्या मृत्युनंतर सातवाहन सिमुख या कर्तबगार राज्याने स्वतंत्र सातवाहन राज्य स्थापन केले. अर्थात त्याच्या राजधानीचे ठिकाण प्रतिष्ठान नगरी आजचे पैठण होय , हा स्तंभ त्याच कालखंडात महाराष्ट्री भाषेच्या राजघराण्याच्या उदयाची निशाणी आहे. सातवाहनाची प्रमुख व्यापारी केंद्र धरणीकोटा ,अमरावती ( आंध्रप्रदेश ) आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे होते. जुन्नर तर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीने राजधानीचे ठिकाणही केले होते.
दक्षिण काशीचा मान व एकेकाळी धर्मपीठाचा अधिकार गाजवणाऱ्या पैठण येथील गोदावरी नदीत दशक्रिया विधी करण्याची परंपरा आहे. प्रतिष्ठाननगरी ही मोक्षधाम म्हणूनही ओळखली जाते. अशा पवित्र तीर्थक्षेत्री स्वर्गाचे प्रतीक म्हणून हा स्तंभ उभारण्यात आला असावा, अशीही आख्यायिका आहे.
मात्र इतिहासाचे अभ्यासक हा तीर्थस्थंभ यादवकालीन असल्याचे आणि त्याची उभारणी बाराव्या शतकात झाल्याचे मत व्यक्त करतात. यादवकालीन शिल्पकलेचा अजोड नमुना असलेले हे शिल्प ४ स्वतंत्र कप्प्यांद्वारे उभारण्यात आलेले आहे. चार भागातील स्तंभ ६.३७ मीटर उंच आहे. स्तंभावर स्वर्ग, मृत्यू व पाताळ सूचित केले आहे. तसेच सप्तमातृका, नृत्यरत गणपती, श्रीदेवी-भूदेवी, शिव व इंद्र, भैरव यांची शिल्पे आहेत. दगडी खांब व टोकदार कमानी तत्कालीन शिल्पकलेची उंची व दर्जा यावर शिक्कामोर्तब करतात. तळावरच्या मातृकामंडळाचे कोरीवकाम करताना शिल्पकाराने संपूर्ण कसब पणाला लावले आहे. भैरवनाथ व त्याच्या गळ्यातील मुंडमाळ, त्यातून स्रवणारे रक्त अन् ते चाटणारा कुत्रा यांचे बारकावे व गूढ संकेत अभ्यासकांना मोलाचे ठरत आले आहेत. स्तंभाच्या मध्यभागी मृत्युलोक आहे. तेथे कोरलेली मैथुनशिल्पे दिसून येतात. मकरमुखाचे अष्टकोनी वर्तुळ व मूर्तीवर कमालीच्या कलाकुसरी आता अंधुक झाल्या आहेत. स्तंभाच्या वरचा भागही शिल्पकलेच्या उच्च दर्जेदारीवर शिक्कामोर्तब करणारा आहे. या खांबाला दगडी जोड देऊन एकत्रित केले आहे. पैठणच्या गतवैभवाची व तेथील शिल्पकलेच्या अजोड सौंदर्याची साक्ष हा तीर्थस्तंभ देतो. अशा प्रकारचा कलापूर्ण स्तंभ पैठणशिवाय रांचीमध्ये (झारखंड) आहे. याशिवाय महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात परळी येथील शिवमंदीरात तसेच परभणी जिल्ह्यात चारठाणा येथेही असेच मानस्तंभ आहेत.
या तीर्थस्तभाजवळ दरवर्षी पाडव्याच्या दिवशी शालिवाहन शक समारोह समिती द्वारे अनेक कार्यक्रम घेण्यात येतात.
असा हा प्राचीन आणि महत्वाचा तीर्थस्तंभ आज मात्र दुर्लक्ष होण्यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काळाच्या ओघात व दुर्लक्षामुळे तीर्थस्तंभाची झीज होत आहे. पैठणच्या या तीर्थस्तंभाचे वेगळेपण देशभरातील अभ्यासक आणि पर्यटकांना आकर्षित करते, मात्र ‘पिकतं तिथं विकत नाही’ या म्हणीप्रमाणे तीर्थस्तंभाची दशा झाली आहे. स्तंभाचे ठिकठिकाणी पापुद्रे निघाले असून तातडीने रासायनिक प्रक्रिया करण्याची गरज आहे. पायथ्याचा काही भाग तुटल्याने चक्क सिमेंटने डागडुजी करण्यात आली होती. या कामाचेही आता तुकडे पडत आहेत. चार टप्प्यात उभारलेल्या स्तंभावर आकर्षक नक्षीकाम आहे. वातावरणाचा प्रतिकूल परिणाम होऊन नक्षीकाम पुसट होत आहे. नगर परिषदेने तीर्थस्तंभ परिसराचे सौंदर्यीकरण केले होते. पण, कायमस्वरुपी सुरक्षारक्षक नसल्यामुळे सौंदर्यीकरणाची दुर्दशा झाली. दिवे, लोखंडी जाळ्या गायब झाल्या असून कारंजे बंद आहेत. स्तंभाच्या सभोवती गाजरगवत आणि कचरा पसरला आहे. मोकाट जनावरांचा मुक्त वावर असलेल्या स्तंभ परिसरात पर्यटकांची निराशा होते. विशेष, म्हणजे हा इतिहासाचा साक्षीदार असलेला तीर्थस्तंभ राज्य सरकारने २० एप्रिल १९९८ ला संरक्षित स्मारक असल्याचे घोषित केले आहे.स्थापत्य शैलीचा अजोड नमुना असलेल्या स्तंभाचे तातडीने जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पालथी नगरी :-
पैठणच्या या नागघाट परिसरात एक मोठे चमत्कारीक व गुढ ठिकाण आहे, ते म्हणजे 'पालथी नगरी'. सध्याचं पैठण शहर हे जरी गजबजलेलं असलं तरी जुनं पैठण अजूनही त्यामानाने शांत आणि निवांत आहे. तिथं वाहतूक आणि गर्दीचा गोंगाट नाही, आहे ती फक्त निरव शांतता. जुन्या पैठणपासून अजून थोडं उंचावर जाऊ लागलं की वाटेत गर्द झाडी, पुरातन भग्न वाडे लागतात. त्या भागाला पालथीनगरी असं म्हणतात, नावाप्रमाणेच खरोखर जमीनीत गडप झालेले वाडे, घर पालथे असल्याप्रमाणे दिसतात. पुर्वी याठिकाणी असणारी मानवी वस्ती भुकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने गडप झाली व कालांतराने हळुहळु उघडी पडली, असं ढोबळमानाने या पालथ्या नगरीचे स्वरुप असावे. शनिमंदिर ते नाग घाट या दरम्यानच्या सुमारे ४० एकर क्षेत्रावरील या परिसरास पालथी नगरी म्हणण्याचे कारण असे की तेथील जुनी घरे रस्त्याच्या खाली असून आजचे रस्ते या घरांवरून जातात.
पुरातत्व खात्याच्या ताब्यात असणार्या या परिसरात अनेक उत्खनन झाली व बराच मोठा एतिहासिक एवज हाती आला. यापैकी काही इथेच असलेल्या वाड्यात बघता येतो. येथे १९३७ साली करण्यात आलेल्या उत्खननात सातवाहनकालीन प्राचीन घरांचे अवशेष सापडले होते. आजही उत्खननात तेथे मातीचे हत्ती,घोडे,उंट व सैनिकही सापडतात.
स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या एका दंतकथेप्रमाणे सध्याची पालथीनगरी ही शालिवाहन राजाची राजधानी होती म्हणजे शालिवाहन राजाचा राजवाडा आणि मुख्य राजधानीचं ते ठिकाण असल्याचं बोललं जातं,
असा हा गुढ पालथ्या नगरीचा परिसर इतिहास अभ्यासकांना नेहमीच आकर्षून घेतो. सामान्य माणसाने तिथला थरार आयुष्यात एकदा तरी अनुभवावा. सध्या काटेरी झुडुपात हरवलेल्या पालथ्या नगरीला संशोधनाची गरज आहे, याच परिसरात चक्रधर स्वामींचे मंदीर असून त्यांचा मोठा आश्रमही याच परिसरात आहे. पैठण हे महानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र आहे.
नाग घाट
पैठण हे अतिप्राचीन शहर असून या नगरीत प्राचीन काळी नागांची वस्ती होती. नागांची वस्ती याचा अर्थ नाग हे देवक असलेल्या वा नागवंशीय लोकांची वस्ती असा होतो. याबाबतचे उल्लेख आजही अनेक लोकगीतांमधून आढळतात. एका लोकगीतामध्ये असे म्हटले आहे, ‘पैठण वस्ती अजब, दिसती वस्ती नागाची। कैक वर्षांची वस्ती होती शालू शंखाची, राजा शालिवाहनाची।।’ याचेच अस्तित्व आज पैठण येथे असलेल्या नाग घाटावरून येते.
पालथी नगरी म्हणतात त्या भागातून गोदावरी नदीकडे जाताना हा नाग घाट लागतो.
नागघाटाच्या आसपास अनेक जुने वाडे व मठांचे अवशेष व निर्मनुष्य इमारती दिसून येतात.
पैठणच्या प्रत्येक काळाशी निगडीत असणारे स्थळ म्हणजे नाग घाट ! या घाटाचा परिसर आपणास एका वेगळ्या वातावरणात घेउन जातो. या ठिकाणी अनेक एतिहासिक घटना घडल्या आहेत. पैठण शहराच्या नैऋत्य दिशेला असणारा हा परिसर जुन्या शहराचा भाग आहे. गोदावरी नदीच्या काठावर बांधलेल्या या घाटावर दोब प्रचंड मोठे बुरुज आहेत. त्यामुळे अनेक पायर्या असूनही याठीकाणी गोदावरी नदीचा प्रवाह कधीही आटत नाही. इथे नेहमीच नौकानयन चालते. गोदावरी नदीच्या पलिकडच्या किनार्यावर असणारे उसाचे मळे, त्यांची हिरवळ मनाला भावते. हा नागघाट म्हणजे पैठण परिसरातील् अनेक दंतकथांचे उगमस्थान असून सर्व दंतकथा या घाटाशी संबधीतच आहेत. या घाटावरील अनेक मंदीरे बघण्यासारखी आहेत. काही मंदीरे तळघरात आहेत.
याच घाटावर संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविण्याचा चमत्कार घडविला होता. या गोष्टीमुळे हा घाट पैठणमध्ये येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या आकर्षणाचे एक केंद्र बनला आहे. औरंगाबाद गॅझेटियरनुसार, रघुनाथराव पेशवे यांचे पुत्र आनंद राव यांनी इ.स. १७३४ मध्ये येथील प्राचीन घाटाचा जीर्णोद्धार केला होता.
सातवाहनकालापासून अस्तित्वात असलेल्या तसेच महानुभाव वाङ्मयात याची नागडोह म्हणून नोंद आहे. या नाग घाट परिसराचे आता सुशोभीकरण करण्यात आले आहे. रस्त्यावरून खाली उतारावर बांधलेल्या अत्यंत रुंद अशा पायऱ्या उतरल्यावर नाग घाटाच्या परिसरात प्रवेश होतो. येथेच एका बाजूस लहानसे पावन हनुमान मंदिर आहे. मंदिरात एका दगडी चबुतऱ्यावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. दुसऱ्या बाजूस शालिवाहनाचा पिता शेषनाग याचे छोटेसे देवळीसदृश मंदिर आहे. या मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेल्या नागाची फणा काढलेली मूर्ती आहे. याबाबत ‘प्रबंध चिंतामणी’ या ग्रंथात आलेल्या उल्लेखानुसार, पैठण नगरीमध्ये एक ब्राह्मणकन्या आपल्या दोन बंधूंसह राहत होती. ती लावण्यवती होती. एकदा पाणी आणण्यासाठी ती नागडोहावर गेली असता शेषराजाने तिला पाहिले. तो तिच्या सौंदर्यावर लुब्ध झाला. त्याने तत्काळ तिचे पाणिग्रहण केले. लवकरच ती गर्भवती झाली. तेव्हा तिच्या वर्तनाचा तिच्या भावांना राग येऊन ते तिला तेथेच सोडून निघून गेले. नंतर ती पैठण येथील कुंभारवाड्यात राहू लागली. तेथे तिने शालिवाहनास जन्म दिला.

या शेषनाग मंदिरापासून खाली घाटाकडे जाताना मार्गावर दोन बाजूला नंदीच्या पाषाणमूर्ती बसवण्यात आल्या आहेत. पुढे येताच दगडी आवारभिंतीत बसवलेले नाग घाटाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. एखाद्या मोठ्या वाड्याचे प्रवेशद्वार असावे, तसे हे द्वार असून त्यास भक्कम लाकडी चौकटही आहे. वरच्या बाजूस नागदेवतेची मोठी प्रतिमा चितारण्यात आली आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर जाताच समोर मोठी मोकळी जागा दिसते. त्यास रेलिंग लावण्यात आले आहे. येथून गोदावरी नदीचे दर्शन होते.

प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने घाटाखाली नदीच्या दिशेने उतरण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी एका बाजूस नागमंदिरातील नागाच्या मूर्तीची छोटीशी प्रतिकृती बसवण्यात आलेली आहे. तेथून खाली उतरून आल्यानंतर बाजूला थोड्या उंचीवर सिद्ध वरुण गणपती मंदिर आहे. हे मंदिर पेशव्यांच्या काळात उभारण्यात आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. या मंदिराची रचना चौकोनी असून त्यास शिखर नाही. मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीवर गरुड व हनुमानाची चित्रे रंगविण्यात आलेली आहेत.
आत मोठ्या संगमरवरी महिरपी देव्हाऱ्यात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मंदिराच्या समोरच्या बाजूस रेड्याची छोटी दगडी मूर्ती आहे. ही मूर्ती गोदाभिमुख असून मूर्तीवर छोटासा मंडप बांधलेला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील चमत्कारकथेनुसार, विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी आपल्या मुलांना मुंजीचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून सनातन्यांनी सांगितलेले देहान्त प्रायश्चित्त घेतले होते. त्यानंतरही आळंदीतील सनातन्यांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या भावंडांना शुद्धिपत्र देण्यास नकार दिला. त्यांनी पैठणला जावे व तेथील ब्रह्मवृंदाकडून निकाल आणावा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार ते मजल दरमजल करीत पैठणला आले. येथील घाटावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात ते उतरले. त्यानंतर त्यांनी येथील ब्रह्मवृंदाकडे जाऊन शुद्धिपत्र देण्याची विनंती केली. त्याचा निर्णय घेण्यासाठी नाग घाटावर ब्रह्मसभा बोलावण्यात आली होती.




ब्राह्मण पंडित तेथे शास्त्रार्थ करीत होते. त्याच वेळी त्या घाटाच्या बाजूने एक व्यक्ती त्याच्या रेड्याला घेऊन चालला होता. तो रेडा हलत नसल्याने तो त्याला जोरजोराने मारत होता. ते पाहून संत ज्ञानेश्वरांचे हृदय कळवळले. त्यांनी त्या व्यक्तीस रेड्यास मारू नको, असे सांगितले. त्यावर सनातनी मंडळी चिडली व आम्ही येथे चर्चा करीत असताना या पोराला रेडा महत्त्वाचा वाटतो, असे म्हणू लागली. त्यावर ज्ञानदेव म्हणाले की परमेश्वर सर्वांभूती आहे. त्या रेड्याच्या आणि आपल्या देहातही एकच परमात्मा वास करीत आहे. हे ऐकून सनातन्यांनी ज्ञानदेवांना धारेवर धरले. आमच्या व रेड्याच्या शरीरात एकच परमात्मा वास करीत असेल तर आम्ही ज्या प्रमाणे वेद म्हणतो, त्या प्रमाणे तो रेडाही वेद म्हणू शकेल का? असा प्रश्न केला. तेव्हा ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या जवळ जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्यांचा दिव्य स्पर्श होताच त्या रेड्याच्या तोंडातून वेदांतील ऋचा बाहेर पडू लागल्या. हा चमत्कार इ.स. १२८७ च्या माघ शुद्ध वसंत पंचमीस शुक्रवारी घडला. नाग घाटावर घडलेल्या या घटनेच्या स्मरणार्थ नंतर तेथे ही रेड्याची मूर्ती बसवण्यात आली. येथेच भिंतीवर तो प्रसंगही चितारण्यात आला आहे.


रेड्याची मूर्ती व सिद्ध वरुण गणेश मंदिर येथून आणखी खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूस उत्तराभिमुख नागेश्वर शिवालय आहे. या मंदिराचा आकार आयताकृती आहे व ते दगडी चौथऱ्यावर दगडातच बांधलेले आहे. या मंदिरावरही शिखर नसून याचे छत सपाट आहे. मंदिराच्या गर्भगृहात संगमरवरी फरशांमध्ये बसवलेली दगडी शिवपिंडी आहे.
जून नाग घाट छायाचित्र
नाग घाटावरून गोदावरी नदीकडे जाताना एक प्रचंड आकाराची शिळेची पायरी आहे. या पायरीवर सप्तमातृका कोरण्यात आल्या आहेत. ही पायरी यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. या घाटाजवळच इंद्रेश्वर महादेव मंदिरही आहे. इंद्रेश्वर महादेव मंदिराची रचना चौकोनी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर भालदार–चोपदारांच्या प्रतिमा रंगवण्यात आल्या आहेत. तेथून प्रवेश करताच आत ओवरीसारखी रचना दिसते. तीन पायऱ्या चढून ओवरीत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीत जाळीदार खिडकी बसवण्यात आली आहे. येथून आतील शिवलिंगाचे दर्शन होते. तेथून डावीकडे असलेल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर एक छोटीसी खोली लागते. या खोलीस अत्यंत छोटा दरवाजा आहे. येथून खाली वाकूनच गर्भगृहात प्रवेश करावा लागतो. गर्भगृह जमिनीपासून खालच्या पातळीवर आहे. येथे असलेल्या शिवपिंडीवर पितळी मुखवटा व त्यासमोर नंदीची लहानशी मूर्ती आहे. हे मंदिर मध्ययुगीन काळातील असल्याचे सांगितले जाते.
पैठण येथील हा नाग घाट वारकरी व नाथपंथीयांचे श्रद्धास्थान आहे. येथे नागपंचमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी या परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. नाथषष्ठीला पैठणमध्ये येणाऱ्या अनेक दिंड्यांचे हे विसावा केंद्रही आहे.
उपयुक्त माहिती:
- पैठण बसस्थानकापासून १.५ किमी,
- तर छत्रपती संभाजीनगरपासून ५१ किमी अंतरावर
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
पैठणचे घाट पर्यटकांचे खास आकर्षण. कृष्णकमल तीर्थ, मोक्ष घाट, नागघाट, सिद्धेश्वर घाट, पिंपळेश्वर घाटांवर धार्मिक विधी व पवित्र स्नानासाठी भाविक येतात. महानुभाव पंथाचे श्री चक्रधरस्वामी यांचेही पैठणमध्ये अधिक काळ वास्तव्य राहिल्याने श्री चक्रधर स्वामी मठामध्ये देशभरातून भाविक येतात. संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरासह
पैठण येथील ढोलेश्वर महादेव
पैठण येथील ढोलेश्वर महादेव मंदिर
अनेक देवांची मंदिरे आहेत. त्यामुळे येथे आलेले भाविक अगदी जवळच असलेल्या दत्त मंदिर, नाथ घाट, श्री ढोलेश्वर महादेव मंदिर, मोठी वारकरी संस्था असलेले गीता मंदिर, गाढेश्वर महादेव मंदिर, गंगेश्वर व गिरीजा माता मंदिर, जैन मंदिर, एकनाथ महाराज पालखी स्थळ, सातवाहन राजाने विजय मिळवल्यानंतर उभारलेला विजयस्तंभ ( तीर्थ खांब ), इंद्रेश्वर महादेव मंदिर, नवनाथ गुफा मंदिर, सिद्धेश्वर महादेव मंदिर, आनंद भुवन (श्रीकृष्ण मंदिर ) आजूबाजूला असलेल्या अनेक तीर्थक्षेत्रांना जातात.
सिद्ध वरुण गणपती पैठण
पैठणच्या नाग घाटावरील स्थापित सिध्द गणपती शेष नागाच्या फण्यावर विराजमान होउन भक्तांचे दु:ख हरण करतो अशी मान्यता आहे. या गणपतीची स्थापना पेशव्यांनी केली असे मानले जाते. सहा फुट उंचीची ही पाषाण मुर्ती शेष नागाच्या फण्यावर विराजीत दाखवलेली आहे. या गणपतीला कमळाची फुले वाहीली जातात. या गणपतीचे अकरा किंवा एकवीस दिवस मनोभावे दर्शन घेतल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात अशी भक्तांची धारणा आहे.
जैन मंदिर पैठण :
पैठण हे एक प्रसिद्ध दिगंबर जैन अतिशय क्षेत्र देखील आहे. दिगंबर जैन मंदिर हे पैठणमधील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असून अतिशय पवित्र क्षेत्र आहे. येथील मंदिरात २० वे जैन तीर्थंकर भगवान मुनिसुव्रतनाथ यांची एक सुंदर काळ्या रंगाची वाळूची मूर्ती आहे. वाळूपासून बनलेल्या देशातील एकमेव असलेल्या मुनिसुव्रतनाथ या जैनधर्मीयांच्या मंदिरात शनि अमावास्या व एरवीही लाखो भक्त येतात.
पैठण येथील प्रसिद्ध असे श्री १००८ शनिग्रह अरिष्ट निवारण मुनिसुर्वतनाथ भगवन की मूर्ति .
देशाचा कानाकोपऱ्यातून लांब ठिकाणांहून जैन बांधव व धार्मिक लोक येथे भेट देतात. आचार्य आर्यनंदी महाराज यांचा जन्म ढोरकिन गावत झाला, ढोरकीनला आर्यनंदीनगर असही म्हणतात, ते भारतात महान मूनी म्हणुन ओखले जायचे. सैतवाल समाजाचे एकमेव जैन आचार्य राहिले आहेत
मौलानासाहब दर्गा :-
शहराच्या आम्नेय दिशेला उंच टेकडीवर अवाढव्य अशी जहाजाच्या आकाराची एका भव्य इमारत आहे. जुन्या उल्लेखाप्रमाणे ते एकवीरा देवीचे मंदिर असून तेथील बांधकाम अतिशय भक्कम आहे.जणु एखाद्या किल्ल्यासारखेच आहे. हा परिसरही गोदा किनारी असलयामुळे अतिशय रम्य असा आहे. येथे बाजुलाच तळघरात सिद्धेश्वराचे मदिर आहे. या स्थळांच्या अलीकडे प्राचीन अशा नवनाथ पंथीयांच्या गुहा असून येथे तळघरात नवनाथांच्या समाध्या आहेत. येथे सरपटतच जावं लागत, सध्या गुहांच्या जीर्णोध्दारामुळे त्या अतिशय प्रेक्षणीय झाल्या आहेत. येथेही भेट देण्यास हरकत नाही यांशिवाय तिरात मशीद हि मुसलमान वास्तू आहे.
एकनाथ महाराज :-
पण या सगळ्यांपेक्षा पैठण आपल्या लक्षात राहते ते एकनाथ महाराजांमुळे. १६व्या शतकातील संत एकनाथ महाराज यांची पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी. संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते.आता थोडे जाणून घेउया एकनाथ महाराजांविषयी !
एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत.नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळेच त्यांचे आई-वडील लवकरच मरण पावले अशी खंत नाथांच्या मनात कायम असायची आणि तसे त्यांनी लिहूनही ठेवले आहे.
एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. गुरु जनार्दन स्वामींचा जन्म १४७९ मध्ये चाळीसगाव येथे झाला होता. देवगिरीच्या किल्ल्याचे ते किल्लेदार होते तसेच महान दत्तभक्तही होते. त्यांचेही एकूण ३३ अभंग आपणास पहावयास मिळतात. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती.यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता.भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. संत एकनाथ महाराजांनी पहिला ग्रंथ “चतुर्रर्श्लोकी भागवत “ हा त्यांचे गुरु श्री जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेने नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पूर्ण केला. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) काव्य अतिशय प्रासादिक आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरती "त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण" प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते.दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.पैठण येथे राहूनच नाथांनी अपार विठ्ठल भक्ती केली. तसेच त्यांच्या ६४ वर्षांच्या आयुष्यात अनेक अभंग, ग्रंथ, पुस्तके, कविता, भारुडे आणि गवळणी सुद्धा लिहिल्या. त्यांचे अपूर्ण लिखाण हे त्यांचे एकनिष्ठ शिष्य गावबा महाराज यांनी केले. त्यानंतर त्यांच्या एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, एकनाथी अभंग गाथा, चिरंजीव पद, रुक्मिणी स्वयंवर, शूकाष्टक टीका, स्वात्मबोध, आनंद लहरी अशा अनेक ग्रंथ आणि कादंबरिंचे लिखाण त्यांनी केले.त्याचे वाचन आजही अनेक भक्तगण करत असतात. एवढेच नव्हे तर संत एकनाथ महाराजांनी जवळजवळ ७५ हजार कवितांचे लेखन केलेले आहे.आपल्याला त्यांचे पंजोबा भानुदास महाराजांच्या साहित्यात देखील एकनाथ महाराजांसारखेच अभंगांपासून ते गवळणी पर्यंत सर्व प्रकारचे लिखाण पहावयास मिळते. तसेच त्यांच्यामुळेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचे सांगितले जाते. तसेच ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणालाच सापडत नव्हती त्या समाधीचा शोध एकनाथ महाराजांनीच लावल्याचे सांगितले जाते. नाथांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी गिरीजाबाईशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. इ.स.सन १५९९ मध्ये फाल्गुन वैद्य षष्ठीला संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यावर हरी पंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पैठणला संत एकनाथ महाराज ज्या वाड्यात राहत होते त्या वाड्याचे रूपांतर मंदिरात करण्यात आले.
नाथ महाराजांच्या आयुष्यात घडलेले काही महत्वपुर्ण चमत्कार
ईश्वर
हा संताचे ब्रीद राखण्यास सदैव तत्पर असतो त्यामुळेच् संताच्या
जीवनचरित्रात असामान्य असे काही चमत्कारिक प्रसंग आपल्याला पहायला मिळतात.
त्यातील काही प्रसंग आपल्यापुढे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.
१) पितरांस श्राद्धान्न
एकदा
नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे
होते. गिरिजाबाईंचा स्वयंपाक तयार होता. नाथवाडयाबाहेरुन जाणाऱ्या तीन चार
हरिजनांस त्या स्वयंपाकाचा सुवास आला. आपल्याला असे अन्न मिळाल्यास किती
बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली. ते अन्न हरिजनांस मिळावे असा
विचार नाथांच्या मनात उत्पन्न झाला. त्यांनी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनांस
वाटण्यास सांगितले. हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठणस्थ ब्राह्मणास
समजले. नाथांच्या घरी श्राद्धान्न घेण्यास त्यांनी नकार दिला. वास्तविकत:
इकडे नाथांनी शुचिर्भूत होऊन गिरिजाबाईं करवी पुन्हा स्वयंपाक करवून घेतला.
तथापि ब्राह्मणांनी नकार दिला. श्राद्धविधी वेळेत होणे महत्वाचे होते
तेव्हा वाट पाहुन नाथांनी पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णु महेश रुपी
पितरांस जेवू घातले व आपले श्राद्ध कार्य पूर्ण केले.*
२) एकच नाथ दोन ठिकाणी
पैठणास
राणु नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत असत. तो व त्याची पत्नी नित्य
नाथांच्या प्रवचनास येत. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड
श्रद्धा होती. एकेदिवशी त्यांच्या मनात विचार आला कि आपण नाथांना आपल्या
घरी जेवण्यास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले ते नाथांनी स्वीकारले.
संपूर्ण पैठणभर चर्चेचा एकच विषय कि नाथ हरिजानाकडे जेवणार. ठरलेल्या
दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण टप्याटप्याने नाथांवर नजर ठेवून
होते. नाथ राणूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ
जेवायला बसले. चमत्कार असा झाला कि, एकाच वेळी लोकांनी नाथांना राणूकडे
जेवतांना आणि आपल्या वाडयात प्रवचन सांगताना दिसले. नाथ एकच, वेळ एकच परंतु
दोन ठिकाणी दोन भिन्न कार्य हे बघून लोकांनी नाथांचा जयजयकार केला.
३) नाथांकडे अनेक परीस
पैठणास
एक सावकार राहत असे. त्याच्याजवळ एक परिस होता तो त्यास खूप जपत असे. एकदा
त्या सावकारास तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा झाली. परंतु परीस घेवून आपण
प्रवासात सुरक्षित राहू शकत नाही हे जाणुन नाथांसारख्या निष्काम श्रेष्ठ
भक्ताजवळ तो परीस सुरक्षित राहील या भावनेने तो नाथांकडे आला. नाथ देवांची
पूजा करीत होते. त्या सावकाराने परीस नाथांकडे दिला; तीर्थयात्रा
झाल्यानंतर तो घेण्यासाठी मी परत येईन असे त्याने नाथांना सांगितले.
नाथांनी तो परीस देव्हाऱ्याखाली ठेवून दिला. बऱ्याच दिवसानंतर तो सावकार
परीस घेण्यासाठी नाथांकडे आला व परीसाची मागणी केली तेव्हा तो परीस देण्यास
नाथांनी उद्धवास सांगितले. परीस काही सापडेना, नाथ म्हणाले कदाचित
निर्माल्यासोबत तो गोदावरीत अर्पण झाला असावा. असे म्हणताच तो सावकार
नाथांना भलतेसलते बोलू लागला. आपण निस्वार्थ असाल असा विचार करुन आपणाजवळ
परीस ठेवण्यास दिला मात्र आपण तो चोरला. नाथांनी त्यास गोदावरीत नेले, तळात
हात घालून ओंजळभर दगडे उचलली व म्हणाले, "तुझा परीस यातुन निवडून घे."
त्या सावकाराने लोखंडाचे गोळे काढले. प्रत्येक दगडास त्याचा स्पर्श होताच
सोने होऊ लागले. नाथांनी त्यापैकी एक देवून बाकी सर्व नदीत टाकुन दिले.
परीसाचा स्पर्श होताच लोखंडाचे सोने होते हे ठीक परंतु नाथांच्या स्पर्शानं
दगडाचे परीस होतात हे मात्र विशेष.
४) पत्रावळी खाली पत्रावळी
नाथांचे
पुत्र हरिपंडीत हे विद्वान; परंतु नाथांचे संस्कृतातील ज्ञान प्राकृतात
सांगणे त्यांना आवडत नसे. यास कंटाळुन ते काशीस निघून गेले. काही वर्षांनी
नाथांनी त्यांची समजुत काढुन त्यांस पैठणास आणले. हरिपंडीत नाथांऐवजी
प्रवचन करु लागले. श्रोत्यांची संख्या रोजच्यारोज कमी होऊ लागली.
नाथांप्रमाणे आपल्यावर लोकांची श्रद्धा नाही हे जाणुन त्यांचा अभिमान कमी
होऊ लागला. परंतु तो संपूर्ण निरभिमान व्हावा असे नाथांना वाटे.
एका
वृद्ध स्त्रीने नवरा हयात असताना सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला
होता. परंतु तो काही कारणाने पूर्ण होऊ शकला नव्हता. तो पूर्ण व्हावा असे
त्या स्त्रीस वाटे. तिने नाथांच्या प्रवचनात एकवाक्य ऐकले कि, एक
ब्रह्मवेत्ता जेवू घातल्यास हजारो ब्राह्मणास भोजन घातल्याचे पुण्य मिळते.
तिने नाथांनाच जेवणाचे आमंत्रण दिले. त्या स्त्रीच्या घरी जाऊन स्वयंपाक
करण्याचे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने स्वयंपाक सिद्ध केला.
नाथांची पत्रावळ मांडली, त्यांना पोटभर जेवू घातले. नाथ जेवण करुन उठले,
’पत्रावळ तूच उचल’ असे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने पत्रावळ
उचलली, परत येवून पाहतो तर पत्रावळ जशीच्या तशी पुन्हा दुसरी उचलली तिसरी
आली तिसरी उचलली चौथी आली, अशा हजार पत्रावळी हरिपंडीताने उचलल्या. त्या
स्त्रीस सहस्त्रब्राह्मण भोजन घातल्याचा आनंद झाला व हरिपंडीतासही आपल्या
वडीलांची महती कळली, अभिमान नष्ट झाला. पुढे हरिपंडीतांनी नाथांप्रमाणेच
पारमार्थिक आचरण ठेवले.
मूकं करोति वाचालं
गावोबा हा
गोदाकाठच्या कुलकर्ण्याचा मुलगा. पुरणपोळी आवडते म्हणुन रोज दे, असा आईजवळ
हटट् करीतअसत. रोज पुरणपोळी देणेआईला परिस्थितीमुळे शक्य नसल्याने तिने
त्यास नाथांकडे पाठविले. हरिपंडीताप्रमाणे गावोबासही सांभाळावे असे नाथांनी
गिरिजाबाईस सांगितले. गावोबास नाथांघरी रोज पुरणपोळी मिळु लागली. तो तिथे
पडेल ते काम करीत असत. तो थोडा वेडसर होता तरीही नाथांच्या कीर्तनप्रवचनात
बसत. त्यास गायत्रीमंत्रही नीट येत नसे. याला नाथांनी मंत्रोपदेश देवू केला
तेव्हां "एकनाथ" याशब्दाशिवाय मी दुसरा मंत्र म्हणणार नाही असे त्याने
नाथांस सांगितले.
नाथांचा भावार्थरामायण नावाचा ग्रंथ युद्धकांडाच्या
४४ व्या अध्यायापर्यन्त आल्यावर समाधी घेण्याचे नाथांनी जाहीर केले.
श्रोत्यांना वाईट वाटले. श्रीकृष्णदास लोळे नावाचा रामायणकर्ता एकदा
नाथांकडे आला होता तेव्हां त्यास युद्धकांडाचे लिखाण संपविण्यासाठी अकरा
दिवस हवे होते. तेव्हां नाथांनी त्याचे मरण अकरा दिवस पुढे ढकलले होते याची
आठवण करुण देत लोकांनी नाथांना ग्रंथ समाप्त करुन जावे असे विनविले. परंतु
नाथांनी सांगितले ’मी जरी गेलो तरी राहीलेले रामायण गावोबा पूर्ण करील.
नाथांनी विनोद केला असे समजुन लोक हसू लागले. परंतु नाथ जे बोलतात ते खरे
होणारच नाथांनी गावोबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य गावोबाने
नाथांसमोर ४५ वा अध्याय लिहून काढला. नाथनिर्याणानंतर तो ग्रंथ गावोबानेच
तडीस नेला नाथांचे लिखाण कोणते व गावोबाचे कोणते हा फरक लक्षात येत नाही
एवढी नाथकृपा गावोबावर झाली.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. एकनाथांची विठ्ठलभक्ती एवढी श्रेष्ठ होती की साक्षात पांढुरंग श्रीखंड्याच्या रूपाने पाण्याच्या कावडी एकनाथांच्या घरी आणत असत अशी श्रद्धा आहे. पाण्याचा तो हौदही या वाड्यात अजून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याध्ये एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असॆ गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे.
एकनाथांची पैठण येथे दोन मंदिरे आहेत. एक त्यांचे देवघर कि ज्यास हल्ली गावातील नाथ मंदिर म्हणून ओळखण्यात येते. तसेच दुसरे मंदिर आहे ते संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थान, कि जे गोदावरी नदीच्या काठी वसले आहे.
संत एकनाथ महाराजांचा वाडा :
नाथ महाराजांचा वाडा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण समाधी मंदिराचा काही अंतरावर आहे. मुख्यतः हे एकनाथ महाराजांचे निवास स्थान आहे. या वाड्याचेच मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. नाथ महाराजांचा जन्म १५३३ तर निर्वाण १५९९ ला झाले त्याच्या सहासष्ट वर्षाच्या आयुष्यातील ४०वर्षे वास्तव्य या वाड्यातले आहे.
संत एकनाथ महाराज यांचा गावातील नाथ मंदिर.. इथा त्यांचा देवघर आहे. हा त्यांचा रहता घर आहे.
गावातील नाथमंदिर हे श्री एकनाथ महाराजांचे देवघर असून येथील मुख्य मूर्ती श्री विजयी पांडुरंगाची आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात एकनाथांच्या पूजेतला बाळकृष्ण ठेवला आहे. या पूर्वाभिमुख वाड्यात किंवा मंदिरात प्रवेश करताच समोर लाकडी खांबां पलीकडे दिसते ते नाथांचं देवघर आहे, नाथ महाराज स्वतः या देवांची पूजा करत होते... मूळ देवघर लाकडी आहे त्यावर सुबक चांदीकाम केलेले आहे. देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते. वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे... आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेवर आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो.म्हणून त्याला विजयी पांडुरंग असे म्हणतात. हे समोर दिसणारे सगळे देव नाथांच्या नित्यपूजेतले देव आहेत. हा विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे

,हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपान मिळालेला आहे ही मूर्ती दिडफुट उंचीची आणि अडीचकिलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं यान मंदिर बांधलं आणि सोनारकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल मग राजाने विचारले की या मूर्ती चे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे...त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठण ला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात तर ते संपेपर्यंत थांबले (राजा रामदेवराय)आणि ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सांगितले तर भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे सांगितले...त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छाये पण राजा सारखे पंचपक्वान्न माझ्याकडे तुला मिळणार नाहीत ,वास्तविक पाहता नाथां श्रीमंत संत नव्हता नाथांना पैठणात चार चौकाचे तेरा वाडे होते हजारो एकर जमीन होती ,रोज कितीतरी लोकं वाड्यात पुरणपोळीचे जेवण जेवत असतं तरीसुद्धा नाथ पांडुरंगाला असं म्हणाले तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली "दास जेवू घाला न.. घाला"म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे . हे ही या मूर्तीच एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर अजूनही ही उमटलेली अक्षरे आहेत. प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हणल्यावर त्यांनी आपल्या पत्नी ला आवाज दिला त्यांचे नाव गिरीजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं नि नाथांच्या समोर धरलं हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नि लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक शुद्ध आणि वद्य एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिढीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला ही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो असे नाथांचे अकरावे वंशज श्री प्रवीण जी गोसावी आहेत जे आजही तिथे वास्तव्यास आहेत त्यांचे म्हणणे आहे.
नाथांची कुलस्वामिनी एकविरा देवीसह अनेक देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. आषाढी वारीसाठी पंढरीस जाणाऱ्या एकनाथ महाराजांच्या पादुका येथेच आहेत. याच भगवंतांनी नाथांच्या घरी १२,१२ आणि १२ असे ३६ वर्षे काम केलं त्यातले बारा वर्षे त्यांनी श्रीखंड्या च्या रूपात वाड्यात असलेल्या रंजणात पाणी वाहीले.
आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी
एकचि काय वदावे भरल्या कार्यार्थ वाहिले पाणी
श्रीखंड्या चंदन उगाळन करी वस्त्र गंगातीरी धुत असे
मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे घट्टे आजही दिसतात अशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे
वाड्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला रांजण आहे ज्यात बारा वर्षे श्रीखंड्याने पाणी भरलेअशी आख्यायिका आहे आज तो व्यवस्थित झाकून सुरक्षेखातर बंदिस्त केलेला आहे हा नेहमीच्या रांजणा सारखा नाहीये तर तो २१फूट खोल आणि१ १/२ (दीड) रुंद पूर्ण काळ्या दगडी पाषाणातले बांधकाम आहे बुडात त्याच्या मधोमध गोमुख आहे तिथून थेंब थेंब पाणी गीदावरीला जाऊन मिळते कुठं मिळतं हे मात्र अजूनही माहीत नाही..त्याकाळचं स्थापत्य शास्त्र साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेला हा रांजण आणि त्यावेळी ठेवलेलं खाली छिद्र म्हणजे ज्या पाण्याला परक्यूलेशन आहे जे पाणी झिरपत राहतं त्याला वर्षभर कोंडून राहिलेले पाणी खराब होत नाही.. नाथांच्या काळात याचा नित्य वापर व्हायचा हजारो लोक रोज घरी जेवायचे.
आजही जेव्हा हा रांजण स्वच्छ केला जातो कोरडा करायला खाली जाणारी माणसं सांगतात की तिथे एकदम गार वाटतं खालच्या गोमुखातून हवा येते ..रंजणाततली पूर्वेकडची भिंत आहे तिथे कोनाडा आहे त्यात पांडुरंग आणि रुक्मिणीची अतिशय सुबक मूर्ती आहे जेव्हा कोणी रंजणात उतरते तेव्हाच ती दिसते... हा रांजण नेमका भरतो कधी हे ही एक वैशिष्ट्य आहे
हा रांजण फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे ज्या दिवशी तुकाराम बीज असते त्याच्या आदल्या दिवशी हा रांजण उघडा केला जातो मागच्या वर्षी जे पाणी भरलेलं असतं ते थोडं थोडं झिरपून अर्ध झालेलं असतं ते या दिवशी उपसावे लागते त्याच रांजणा शेजारी दुसरं छिद्र आहे त्या छिद्राला मोठ्ठ नरसाळं लावून त्यात हे उपसलेलं पाणी सोडलं जातं जेणे ते इकडे तिकडे कुठे फेकले जाऊ नये कुणाच्या पायदळी येऊ नये हा हेतू यामागे असावा असे वाटते याचं सुद्धा दुसरं छिद्र गोदावरीला जाऊन मिळालं आहे हे सगळं फार अद्भुत आहे

यानंतर सगळा रांजण कोरडा करून घेऊनत्याला धूप देऊन फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम बिजेपासून नाथांच्या शष्टीचा उत्सव सुरू होतो मग या रंजणाची पूजाकरून पैठणातील ब्रम्हवृंद, नाथवंशज, नाथांवर श्रद्धा असणारे देशातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व यात सामील होतात तुकाराम बीजेच्या दिवशी त्यांच्या वंशजातील सुवासिनी स्त्री पहिल्यांदा पाणी टाकते आणि पुढे हा रांजण भरण्याचा कार्यक्रम चालू होतो इच्छुक सर्व स्त्री पुरुष लहान मूल अगदी कोणीही गंगेतून ओलेते होऊन घागर, कळशी अगदी जे झेपेल तशी लहानमोठी घागर घेऊन ती धातूची असावी ही मात्र अट असते पाणी आणून रंजणात टाकणे अहोरात्र चालू असते कधी चार घागरीत भरेल कधी हजरो घागरी टाकल्यातरी भरणार नाही कधी पहिल्या दिवशीच तर कधी पाचव्या दिवशी ही भरतो. हा भरलेला ओळखायचा कसा ? तर तिथे उत्सवा दरम्याम एक व्यक्तीची खास नेमणूक याच कामासाठी केलेली असते जेव्हा रांजण भरतो तेव्हा पाण्याला प्रचंड उसळी येऊन पाणी बाहेर पर्यंत उडते तेव्हा तिथे खास नेमणूक असल्याने मोठ्यांदा गजर करायचा "देवाचा रांजण भरला हो.."तेव्हा हजारो माणसं दर्शन घेत असतात त्यातीलज्यांना श्रीखंड्या ची आख्यायिका माहिती आहे ते उत्सुकतेने येऊन विचारतात कुणाच्या हाताने भरला कधी ती व्यक्ती सापडते कधी सापडत ही नाही जर सापडली तर त्या व्यक्तीचा यथोचित सन्मान केला जातो की त्याच्या रूपाने भगवंत पाणी भरून गेले म्हणून
आजही नाथांच्या त्यांच्या घरी चारशे वीस वर्षानंतर भगवंत पाणी भरतो असं मानलं जातं
असा हा नाथ वाडा आणि त्याची ही आख्यायिका अत्यंत पवित्र, पूजनीय शांतिब्रम्ह....! नाथां जवळ काय मिळतं तर परम शांती ,शांतीचा उगमच त्यांच्यातून होतो
"सकल संतांचा हा राजा
स्वामी एकनाथ माझा"
असं निळोबा रायानी म्हणलेलं आहे याची प्रचिती येतेनाथांचे गुरू जनार्धन स्वामी आणि त्यांचे गुरू दत्तात्रय महाराज म्हणजे स्वतःच्या गुरू चे गुरू म्हणजे नाथांचे दत्तात्रय भगवान परात्पर गुरू नाथांच्या घरी भालदारकी केली असे मानले जाते म्हणून वाड्याच्या बाहेर एका बाजूला हनुमंतराय आहेत तर एक बाजूला दत्तात्रय आहेत.याहूनच नाथांचे श्रेष्ठत्व समजते.
श्रीखंड्यासने ज्या रांजणात पाणी भरले तो रांजण, ज्यावर चंदन घासले ती सहाण, ज्यात श्रीकृष्ण गुप्त झाले तो उद्धव खांब येथे आहे. नाथमहाराज ज्या खांबास टेकुन प्रवचन करीत तो पुराणखांबही येथेच आहे. भगवान दत्तात्रेयांनी जेथे उभे राहून चोपदारकी केली ते स्थानही येथे दाखविण्यात येते. नाथवाड्यात देवघरासमोर दोन खांब आहेत त्यातला एक पुराण खांब ज्याला टेकून नाथ प्रवचन सांगायचे तर दुसरा आहे उद्धव खांब ज्याची आख्यायिकाआहे ती अगदी थोडक्यात अशी, भगवंताने नाथनकडे केशव, श्रीखंड्या,उद्धव या रुपात१२,१२,१२असे तीन तप चाकरी केली तो काळ पूर्ण झाला तेव्हा द्वारकेत एक भक्त हट्टाला पेटला भगवंताचे दर्शन हवे आहे म्हणून तेव्हा रुक्मिणीने त्याला सांगितले की भगवंत गेल्या छत्तीस वर्षांपासून द्वारकेत नाही आहेत तू इथे बसू नकोस ते भेटणार नाहीत ते, तेव्हा तिने सांगितल्या प्रमाणे पैठण स्थित भगवंतास शोधत ती व्यक्ती आली नाथांची चाकरी करणारा केशव, श्रीखंड्या, उद्धव कुठे आहे तो द्वारकेतला कृष्ण आहे त्याला मला भेटायचच आहे हे जेव्हा भगवंताला समजले तेव्हा ते उद्धव रूप या खांबत अंतर्धान पावले असे केशवकृत नाथांचे चरित्र लिहिणारे लेखक होते जे नाथांच्याच कुळातले होते ते त्यांचे शिष्य ही होते ते नाथांची प्रत्येक कृती (नित्यक्रम) रोजनिशी सारखी लिहीत असत.
या वाड्याला आतले नाथ आणि गावाबाहेर गोदावरीच्या पात्रात ज्या ठिकाणी एकनाथांनी देह ठेवला त्या ठिकाणाला बाहेरचे नाथ असं गावकरी म्हणतात. तिथे एकनाथांचे समाधिमंदिर बांधण्यात आले आहे. फाल्गुन वद्य षष्ठीला नाथषष्ठी म्हणतात. ही एकनाथ महाराजांची पुण्यतिथी. यानिमित्त सहा दिवसांचा मोठा उत्सव होतो. अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सव संपतो. सद्यस्थितीत पैठण हे शहर संत एकनाथ यांच्यामुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असुन प्रतिदिनी नाथांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची संख्या २ ते ३ हजार एवढी आहे. येथे दर शुद्ध एकादशीस एक लाख भाविक तर वद्य एकादशीस अंदाजे ३० हजार भाविक जमतात. एकनाथषष्ठी हा येथिल मुख्य उत्सव असून या तीन दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ५ ते ६ लाख भविक पैठणमध्ये येतात. एकनाथषष्ठी उत्सवातल्या तीनही दिंड्या ह्या ठिकाणाहून निघतात. त्याचप्रमाणे आषाढीचा पालखी सोहळाही या ठिकाणाहून निघतो. प्रत्येक एकादशीस येथे महापूजा करण्यात येते. गोकुळ अष्टमीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे इतरही पारंपारिक, नैमित्तिक उत्सव येथे साजरे केले जातात. येथे अनेक मठ मंदिर असून वारकरी शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी येथे राहतात. येथे महाराष्ट्र शासनाने संतपीठाची उभारणी केली आहे. मंदिर परिसरात नाथ वंशीयांची घरे आहेत.
संत एकनाथ समाधी मंदीर :-
हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या संत एकनाथांचे समाधीस्थान पैठण शहरात आहे. पंढरपुर नंतरची सर्वात मोठी यात्रा पैठणलाच भरते. नाथांचे समाधी मंदीर प्राचीन असून गोदावरी तीरावरच आहे ( एकनाथ महाराजांनी जलसमाधी तिथेच घेतली होती ).
श्री संत एकनाथ महाराज पादुका .
संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थान, कि जे गोदावरी नदीच्या काठी वसले आहे. भव्य अशा कमानीतून आत गेल्यावर दोन्ही बाजून निरनिराळ्या वस्तूंच्या दुकान आहेत. त्यावरच भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे. मंदिराचा आवार भव्यदिव्य असून तेथील दगडी तटबंदी ही अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे कळते. मंदिरास चारी दिशांनी दरवाजे असून महाद्वार हे पूर्वाभिमुख आहे, पश्चिमेस गोदावरी द्वार, उत्तरेस दत्त द्वार तर दक्षिणेस जनार्दनस्वामी द्वार आहे. महाद्वारातून प्रवेश केल्यावर डाव्याहातास अजानवृक्षाचे झाड असून ते शेवटची घटका मोजत आहे. मुख्य समाधी मंदीर पुर्ण सागवानी लाकडांनी बांधलेले असून लाकुड अतिशय चमकदार आणि देखण आहे. मंदीराचा परिसर मोठा आहे. आजुबाजुला अनेक मठ, मंदीरे यांचा समुह आहे. एकनाथ महाराजांच्या समाधीमागे उद्धवांची समाधी आहे. हे उद्धव एकनाथ महाराजांच्या भावकीतील असून नाथांच्या लग्नाचे वेळी पैठणास आले व नंतर नाथांचे शिष्य बनले. नाथ समाधीच्या उत्तरेस नाथ शिष्य गावोबा यांची समाधी असून हे गावोबा नाथांच्या अनेक प्रमुख शिष्यांपैकी एक होत. गाभाऱ्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूस दोन ओवऱ्या असून मोठी घंटा लावण्यात आलेली आहे. मंदिर मुख्यतः लाकडी स्वरूपाचे असून गाभाऱ्यातील उंचच उंच लाकडी खांब लक्ष वेधून घेतात तसेच लाकडाची नक्षीदार सिलिंग आकर्षक दिसते. मंदिरात समाधीच्या अगदी वर एकनाथ महाराजांचा एक जुना फोटो लावण्यात आला असून नाथ समाधीच्या समोरील बाजूस प्रवेशद्वारावर संत एकनाथांचे ११ वे वंशज संस्थांनाधिपती श्री भानुदास महाराज गोसावी यांचा फोटो लावण्यात आला आहे. हे मंदिर एकनाथांच्या वंशजांनी बांधले आहे. आत प्रवेश केल्यानंतर उजव्या हातास शेंदूर लावलेल्या दक्षिण मुखी मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर एकनाथ महाराजांच्या समाधीच्या आजूबाजूस काही पादुकायुक्त समाध्या आहेत. डावीकडे तीन तर उजवीकडे दोन समाध्या आहेत. समाधीकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताची पहिली समाधी ही नाथांचे मोठे नातू प्रल्हाद यांची असून त्याच्या नंतर लहान नातू राघोबा यांची तेथे समाधी आहे. त्यापुढील छोटी मंदिरसदृश्य समाधी ही एकनाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण महाराज यांची आहे. उजव्या बाजूस नाथ समाधीपेक्षा थोडी छोटी मंदिर सदृश समाधी ही एकनाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित महाराज यांची आहे. हरिपंडित यांनी सुरुवातीच्या काळात नाथांच्या सर्वसामावेशकतेचा विरोध केला व परिवारासह काशीस निघून गेले, नाथांच्या आज्ञेवरून पुन्हा ते सपरिवार पैठणास आले. पुढे काही घटना घडल्या व त्यांना नाथांचा अधिकार कळाला व ते नाथांचे शिष्य बनले. नाथांनी जलसमाधी घेतल्यानंतर यांनीच नाथसमाधीस्थित पादुकांची स्थापना केली आहे. उजवीकडील शेवटची समाधी ही नाथांचे दुसरे नातू मेघश्याम यांची आहे. मंदिर पहाटे ५ वाजता उघडते. पहाटे साडेपाचला काकडआरती होते. त्यानंतर आरती होते. दुपारी नैवेद्य तर संध्याकाळी सूर्यास्तासमयी नाथसमाधीची पूजा करण्यात येते. यास स्थानिक लोक भागीरथी असे संबोधतात. रात्री शेजारती होऊन १० वाजता मंदिर बंद होते. प्रति शुद्ध एकादशीस लाखो भाविक नाथसमाधीचे दर्शन घेतात. एकनाथ षष्ठी हा येथील महत्वाचा उत्सव असून ही वारी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणून सुपरिचित आहे. संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर असे लक्षात आले कि, दररोज येथे सुमारे पाच ते सहा हजार भाविक विविध ठिकाणावरून नाथ दर्शनासाठी येतात.
श्री क्षेत्र पैठण, श्री एकनाथ महाराज व श्री एकनाथषष्ठी विशेष महत्व.
श्रीएकनाथष्ठी
हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर श्रीएकनाथमहाराज जलसमाधी दिन
म्हणुन साजरा करण्यात येतो. विशेषत: पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविक ह्या
सोहळ्यास उपस्थित असतात. पैठण येथील नाथषष्ठीची वारी वारकरी संप्रदायातील
दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी असून पंढरपुरच्या आषाढी वारी नंतर ह्या वारीस
मोठया प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित होतो. विविध ठिकाणांहून आलेल्या ४७५
दिंडया, "भानुदास-एकनाथ" चा गजर हयामुळे संपूर्ण परिसर न्हाऊन निघतो.
फाल्गून
वद्य षष्ठी, सप्तमी व अष्टमी (साधारणत: मार्च महिना) ह्या दिवसांत हा
उत्सव साजरा करण्यात येतो. द्वितीयेस गावातील नाथमंदिरातील रांजणाच्या
पूजेनं उत्सवाची सुरूवात होते. द्वितीया ते पंचमीपर्यन्त श्रीकेशवस्वामीकृत
नाथ चरित्राचे पारायण करण्यात येते. पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे
आमंत्रण दिले जाते.
षष्ठी - षष्ठीच्या दिवशी पहाटे २ वाजता
श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो. नाथवंशजांची
मानाची पहिली दिंडी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून
श्रीएकनाथमहाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते. मंदिरात
नाथवंशजांच्या वतीनं वारकरी व हरिदासी कीर्तनं करण्यात येतात. गावातील
मंदिरात परतल्यानंतर आरती होते. सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंडया नगर
प्रदक्षिणा करुन गोदाकाठी आपापल्या फडात/मठात विसावतात.
सप्तमी - सप्तमीच्या
दिवशी रात्री १२ वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात
येते. त्यास छबिना असे म्हणतात. पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात
आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते, भारुड सादर केली जातात.
सकाळी ७ वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते. वारकऱ्यांच्या
फडांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते. वाळवंटात कीर्तन
ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते.
अष्टमी - अष्टमीच्या दिवशी
सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गावातील नाथमंदिरातून काला दिंडी निघते.
उदासीमठाजवळील पायऱ्यांवर पावल्या खेळण्यात येतात. हे दृश्य आपल्या डोळ्यात
साठविण्यासाठी हजारोंचा समुदाय येथे उपस्थित असतो. समाधी मंदिरात
पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुंगाच्या गजरात शेकडो भाविक
पावल्या खेळण्यात तल्लिन होऊन जातात. मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि
लाह्या यांचे मोठेमोठे लाडू आकर्षकरित्या बांधण्यात येतात.
त्याच्या
मध्यभागी काला भरलेली हंडी लटकविलेली असते. सूर्यास्तासमयी ’दत्तात्रय
जनार्दन श्री एकनाथ’ च्या जयघोषात नाथवंशजांकडून काठीच्या सहाय्यानं ती
हंडी फोडण्यात येते. प्रसाद मिळविण्यासाठी भाविकांची झुंबड उडते. परंपरेचे
अभंग, गौळणी, आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो. या
तीनही दिवसांमध्ये श्रीएकनाथमहाराजांच्या पैठणकर फडातील हजारो वारकरी
दिंडीत सहभागी होत असतात. शिवाय इतरही दिंड्या आपआपल्या पध्दतीनं
सोहळ्याचा आनंद लुटतात. सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची
संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ,
खान्देश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच
कोकण, मुंबई, कर्नाटक आदी परिसरातून दिंडया घेवून येण्यासाठी भाविक उत्सुक
असल्याने येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे. नाथषष्ठी हा उत्सव विदेशी
लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असुन अनेक विदेशी पर्यटक सोहळा
पाहण्यासाठी पैठणास येतात.
उत्सवाचा इतिहास
फा. व. ६ ह्या
दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वश्रेणी असं म्हणतात. नाथ स्वत:
आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत.
पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्रीएकनाथषष्ठी म्हणून हा
दिवस साजरा करण्यात येवू लागला.
पंचपर्व
१) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म
२) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह
३) नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह
४) श्री जनार्दनस्वामी पुण्यतिथी
५) श्रीएकनाथमहाराज जलसमाधी
श्री बाळासाहेब पाटील एतिहासिक वस्तुसंग्रहालय :-
पैठणचे पोलिसपाटील व स्वातंत्र्यसैनिक श्री. बाळासाहेब पाटील यांनी अथक परिश्रमाने जमवलेल्या प्राचीन वस्तुंचा संग्रह ज्ञानेश्वर उद्यानात आहे. पैठणचे पोलिस पाटील बाळासाहेब एक शेतकरी देखील होते, पण पैठण परिसरात सापडणार्या वस्तुंचा संग्रह करण्याचा छंदच त्यांना लागला. जवलपास ३० हजार वस्तु त्यांनी जमवल्या.
हाच संग्रह त्यांच्या वाड्यातून १६ जून १९९७ ला ज्ञानेश्वर उद्यानात स्थलांतरित करण्यात आला. महाराष्ट्रातील हा सातवाहनकालीन एकमेव संग्रह आहे.
त्यांच्या संग्रहालयात काय नाही ? नाणी, पोथ्या, चित्रे, धातुच्या आणि दगडाच्या असंख्य मुर्ती, आभुषणे, वेगवेगळे कंदील, दिवे, अडकित्ते, कलाकुसरीच्या वस्तु, भांडी, नानाविध कलात्मक वस्तु, दोन हजार वर्षापुर्वीचे सातवाहनकालीन नाण्याचे साचे, मुद्रा, सातवाहनकालीन विटा, अशा एक ना अनेक वस्तु संग्रहालयात आहेत.
इथल्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयामध्ये दुसऱ्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हस्तलिखित, शृंगारपेटीसह विविध कालखंडातील दगडी मूर्ती शिल्प, काचेवरील चित्र, दुसऱ्या शतकातील शाडूच्या मातीची स्त्रीशिल्प, शस्त्रात्रे, वाघनखे, पानपुडे बघता येतात.
हे संग्रहालय पाटीलांनी विनाअट राज्यशासनाला दिले असून आज ते पुरातत्वखात्याच्या ताब्यात आहे. पाटलांनी जमा केलेल्या या वस्तु म्हणजे पैठणच्या इतिहासाचा अमोल खजिना आहे. संग्रहालयाची प्रवेश फि अत्यल्प असून पर्यटकांच्या सोयीसाठी रात्री आठ वाजेपर्यंत उघडे असते.
महाराष्ट्रातील प्रमुख वस्तुसंग्रहालयात बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालयाचा समावेश होतो. मात्र, त्या तुलनेत या संग्रहालयात विशेष सुविधा नाहीत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय नसल्याने अडचण निर्माण होते. मात्र, शासनाचे या वस्तुसंग्रहालयकडे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळाते. या वस्तुसंग्रहालयातील दोन हजार पुरातन वस्तू आज जागेअभावी कुलूप बंद आहेत.
वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी प्रत्येकी तिकीट ३ रुपये असून विद्यार्थ्यांसाठी एक रुपये दर आहे, तर सहल असेल तर ५० पैसे दर आकारले जातात; परंतु वस्तुसंग्रहालय हे संत ज्ञानेश्वर उद्यानात असल्याने उद्यानाचे तिकीट १५ रुपये आहे. येथे राज्यातून इतिहास अभ्यासक विद्यार्थी संग्रहालय पाहण्यासाठी येतात. त्यांनाही उद्यानाच्या तिकिटाचा भुर्दंड सोसावा लागतो. या वस्तुसंग्रहालयासाठी एक हेक्टर वेगळ्या जागेची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे शासनाचे लक्ष नाही.
जायकवाडी धरण :-
जायकवाडी धरण पैठण शहराजवळच आहे. जायकवाडी धरण आशिया खंडातील सर्वात मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक आहे. त्याची लांबी१०किमी आहे. या धरणाला पाण्याच्या विसर्गासाठी एकूण २७ दरवाजे आहेत.हे धरण पसरट स्वरूपाचे आहे.जायकवाडी धरणामुळे तयार झालेल्या जलाशयाचे नाथ सागर असे नाव आहे. गोदावरी आणि प्रवरा नद्यांचे पाणी यात येते. हे जलाशय ५५ किमी लांब व २७ किमी रुंद आहे.
एशिया खंडातिल दुसर्या क्रमकाचा माती चा धारण.....













जायकवाडी धरणाच्या पाण्यावर १२ मेगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता असलेले एक जलविद्युत केंद्र आहे. वीजनिर्मितीसाठी वापरले पाणी पंप वापरून मुख्य जलाशयात परत टाकले जाते. ज्यामुळे त्या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी पुनर्वापर करता येतो.पैठण हे नाथ सागर जलाशय आणि ज्ञानेश्वर उद्यान या लोकप्रिय पर्यटनस्थळांसाठीही प्रसिद्ध आहे. नाथ सागर जलाशयात येणाऱ्या स्थलांतरित पक्षांना पाहण्यासाठी अनेक पक्षिअभ्यासक या ठिकाणी येतात.
ज्ञानेश्वर उद्यान :-
नाथसागर जलाशयाच्या पार्श्वभुमीवर धरणाच्या समोरच ३१० एकर क्षेत्रात प्रचंड मोठे असे 'संत ज्ञानेश्वर उद्यान' साकारण्यात आले आहे. ज्ञानेश्वर उद्यान हे म्हैसूरच्या वृंदावन उद्यानाप्रमाणे असल्यामुळे हे पर्यटकांचे अतिशय लाडके स्थळ आहे. म्हैसुरच्या वृंदावर गार्डन , काश्मीरच्या शालिमार बागेच्या धर्तीवर याची निर्मिती केली आहे प्रथम पाटबंधारे खात्याच्या अखत्यारीत असणार्या उद्यानाचे खाजगीकरण झाल्यानंतर ते पुण्याच्या ग्लास फायबर इंडस्ट्री यांना चालवण्यात देण्यात आलेले आहे.मुळ उद्यानाचा आराखडा अतिशय सुंदर असून त्यात फलोद्यान, फुलोद्यान, वनोद्यान, बालोद्यान अशा प्रकाराच्या वेगवेगधमा विभागांची रचना केलेली आहे. महाराष्ट्रात प्रथमच पैठणला संगीत-संगीत कारंजाच्या प्रयोग करण्यात आला.
संत द्यानेश्वर महाराजांच्या जीवनातील कही घटना .. सुन्दर आकृति
संत द्यानेश्वर महाराजांच्या जीवनातील कही घटना .. सुन्दर आकृति
संत द्यानेश्वर महाराजांच्या जीवनातील कही घटना .. सुन्दर आकृति
संत द्यानेश्वर महाराजांच्या जीवनातील कही घटना .. सुन्दर आकृति
संत द्यानेश्वर महाराजांच्या जीवनातील कही घटना .. सुन्दर आकृति
संत द्यानेश्वर महाराजांच्या जीवनातील कही घटना .. सुन्दर आकृति
संत द्यानेश्वर महाराजांच्या जीवनातील कही घटना .. सुन्दर आकृति
संत द्यानेश्वर महाराजांच्या जीवनातील कही घटना .. सुन्दर आकृति
संत द्यानेश्वर महाराजांच्या जीवनातील कही घटना .. सुन्दर आकृति
उद्यानाच्या सर्व भागांतून कालव्याद्वारे प्रवाहीत केलेले पाणी, आजूबाजूला असलेले विविध फुलांचे असंख्य ताटवे, प्रसन्न वातावरण यामुळे आपण काश्मीरला जसल्याचा अनुभव येते. त्यात भर पडते ती कोणत्यातरी गाण्याच्या संगीतावर नृत्य करणाऱ्या पाण्याच्या कारंजाच्याची तेही वेगवेगळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ! आता मनोरंजनासाठी पूर्ण उद्यानाला फेरफटका मारणारी 'टॉय ट्रेन' आहे छोटे वॉटर पार्क, अनेकविध खेळणी ( अम्युझमेंट पार्क ) उंटाची सफर, जादूचे प्रयोग, कठपुतलीचा खेळ असे अनेक पर्याय आपल्यासमोर असतात. मुळात उद्यानाचा पूर्ण परिसर इतका सुंदर आहे की वेळ कसा जातो ते समजत नाही पोटपूजेची सोयही इथे उत्तम प्रकारे होऊ शकते. या उद्यानात एक दिवस राहण्यासाठी सर्व सोयींनी युक्त 'झोपडी' कॉटेज बनवण्यात आले आहे. याशिवाय याच व्यवस्थापनाच्या ताब्यात असणारा जायकवाडी येथील सुप्रसिद्ध बंगला, ( LB ) जो नाथसागर जलाशयाच्या किनार्यावर आहे, तेथेच एक रमणीय नारळीबाग ही आहे. तिथेही मुक्कामाची सोय होऊ शकते मागच्या बाजूस पक्षी अभयारण्याचा परिसर आहे (या बंगल्यात मा.पंतप्रधान इंदिरा गांधीचा मुक्काम होता) याच उद्यानात 'संत पीठाचे कामही जोरात चालू आहे. परिसरात अतिशय भव्य दिव्य असे ज्ञानमंदीर असून त्यात संत ज्ञानेश्वरांचा अतिशय सुंदर पुतळा आहे. तिथल्याच एका इमारतीत महाराष्ट्र शासनाचे बाळासाहेब पाटील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय आहे. उद्यानाला भेट देण्यासाठी संध्याकाळची वेळ उत्तम ! धरणाच्या भिंतीवरुन सुर्यास्ताचे मनोरम दर्शन घेउन पैठण शहराचे विहंगावलोकन करून पसरत जाणाया गोदावरी पात्र पाहा नंतर संत ज्ञानेश्वर उद्यानाला भेट देण्यासही हरकत नाही.
जायकवाडी पक्षी अभयारण्य-
नाथ सागर जलाशयात उथळ पाण्यामध्ये विविध आकारांची ३०बेटे निर्माण होतात. या बेटांवरील झाडे स्थलांतरित पक्षांना एक आदर्श निवारा पुरवतात. या धरणाच्या परिसरात पक्षी अभयारण्य तयार केले गेले आहे.ज्यामुळे अनेक रहिवासी आणि स्थलांतरित पक्षांच्या प्रजातींना इथे निवारा मिळतो. जवळजवळ २०० तऱ्हेचे पक्षी इथे आढळतात, ज्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या ७० हून अधिक प्रजाती आहेत. यापैकी ४५ प्रमुख प्रजाती विदेशातून स्थलांतर करून येतात.
शंकरराव जी चव्हाण स्मारक –
पैठण शहराने महाराष्ट्राला शंकरराव जी चव्हाण यांच्या रूपाने एक उमद् व्यक्तिमत्त्व दिल . जे स्वकर्तुत्वाने महाराष्ट्र भर गाजले. १४ जुलै १९२० रोजी पैठण येथे शंकर राव जन्माला आले . १४ मार्च १९६६ रोजी पैठण चा हा सुपुञ महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री झाला . यांनीच ( नाथसागर) जायकवाडी प्रकल्पाची निर्मिती करून मराठवाड्याला जल संजीवनी प्राप्त करून दिली .
पैठणी साडी –
अनादी काळापासून पैठण ला कलासौख्य लाभले आहे. पैठण ची पैठणी हा त्याचाच एक भाग,किंबहुना महाराष्ट्राचे ते महावस्ञ आहे . गेली दोन हजार वर्षे पैठण ने या कलेची निस्सिम सेवा करत आहे . गर्भ रेशमी संपूर्ण जरीचा पदर आणि रूंद व ठसठषित वेलबुट्टीचे काठ हि पैठणीची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
यानिमीत्ताने आपण पैठणीचा इतिहास जाणून घेउया.
कापसाचा शोध मानवी जीवनातील अतिशय क्रान्तिकारी घटना होय. कारण या शोधामुळे मानवाची रानटी अवस्था संपून त्याची सुसंस्कृत अवस्थेकडे वाटचाल सुरु झाली. आता नखदंतावलंबी, भटके, अर्धनग्न जीवन संपून स्थिर व निश्चित जीवनास आरंभ झाला. कारण कापूस पिकविणे म्हणजे कृषीजीवन जगणे होय.आता त्याला झाळांच्या ओधड-धोबड साली नेसण्याची व मृत जनावरांची कातडी पांघरण्याची आवश्यकता नव्हती. कारण कापसापासून सहजरीतीने वस्त्रे तयार करता येत होती. तसेच ती टिकाऊ असून धुता येत होती त्यामुळे त्यांचा झपाट्यांने प्रसार झाला.
कापसापासून कापड तयार करण्याचे ज्ञान त्याला पशुपक्ष्यांपासून अवगत झाले असावे. स्त्रियांनी या क्षेत्रात कमालीची प्रगती साधली. कारण स्त्रिया वस्त्र विणन्यात प्रवीण असल्याचे अनेक संदर्भ आपणास प्राचीन वाङ्मयामध्ये सतत आढळतात.
रेशमाचा शोध ही सुद्धा मानवी जीवनातील अत्यंत सुखद घटना होय. रेशीम कापसापेक्षा मुलायम असून त्याची वस्त्रे अधिक आकर्षक व टिकाऊ असतात. तथापि भारतीयाना रेशीमतयार करण्याचे ज्ञान नव्हते असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. कारण रेशमाची पैदास करणारा चीन हा एकमेव देश असून त्याने हेज्ञान इसवी सनाच्या काही शतकांपर्यंत अत्यंत गुप्त ठेवले होते. आजही जगामध्ये भारतीय रेशमापेक्षा चिनी रेशीम अधिक लोकप्रिय आहे. तसेच प्राचीन साहित्यामध्ये रेशमाचा उल्लेख ‘चीनसुक’ अशा प्रकारे आलेला आढळतो. त्यामुळे वरील विधानास पुष्टी मिळते. त्यामुळे रेशमाचे उत्पादन व त्यापासून वस्त्र तयार करण्याची कला भारतीयाना ज्ञात नसावी असा समज पसरण्यास मदत झाली.
असे असले तरी पुरातत्व शास्त्रज्ञाना अगदी अलिकडे नवीन पुरावे उपलब्ध झाले आहेत. प्रागैतिहासिक व ऐतिहासिक स्थळांच्या उत्खननामध्ये अगदी खालच्या थरात रेशमाचे अवशेष उपलब्द झाले आहेत. या सर्व पुरातत्वीय पुराव्यावरून येथील मानवास कापसाप्रमाणेच रेशमापासून वस्त्रे तयार करण्याची कला प्रागैतिहासिक (proto-historic) कालापासून अवगत असल्याचे स्पष्ट होते. या बरोबरच त्याला जरतारी व भरतकामाचेही ज्ञान असल्याचे समजते.

प्राचीन साहित्यामध्ये सुती, रेशमी व भरजरी कपड्यांचे उल्लेख विपुल प्रमाणात सापडतात. ऋग्वेदामध्ये जरतारी वस्त्राचा उल्लेख हिरण्यद्रपी म्हणून आला आहे. तर महाभारतामध्ये याचा उल्लेख मणिचिरा असा करण्यात आला आहे. यामध्ये जरतारी कामाबरोबरच माणिक-मोती व मौल्यवान हिरे गुंफण्याच्या नोंदी मिळतात. अशा प्रकारच्य मौल्यवान रेशमी वस्त्रांचा उल्लेख जैन साहित्यामध्ये पट्टा या नांवाने करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्रातील मौल्यवान वस्त्रांचा विचार केल्यास महानुभाव साहित्यामध्ये पैठणच्या भरजरी उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य प्रवाशांच्या नजरेतून अशा प्रकारची वस्त्रे व ही वस्त्रे निर्माण करणारी केन्द्रे सुटली नाहीत. एकंदरीत प्राचीन कालापसून भारतामध्ये अशा प्रकारची वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते.

पारंपारिक कलाकाराने निर्माण केलेली ही अमोल वस्त्रे प्रतिकूल अशा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये टिकून राहिली यामध्येच त्यांचे मोठेपण दिसून येते. वैचित्र्यपूर्ण नक्षीकाम आणि उच्च पोत (texture)यामुळे जागतिक बाजारपेठातून भारतीय वस्त्रानी एकाधिकार प्रस्थापित केला. आणि दोन सहस्त्रकाहून अधिक काळ हा एकाधिकार अबाधित राहिला.
सुबक वीणकाम व त्यावरील गुंतागुंतीच्या विरंजन (bleaching)आणि रंगप्रकिया (dyeing) तसेच कोणत्याच प्रकारच्या आधुनिक तंत्राचा वापर न करता हाताने किंवा मागाचे सहाय्याने त्यावर नक्षीकाम करणे, हे युगानयुगांच्य परिश्रमाचे फलित मानावे लागेल. अशा प्रकारची कला ही सर्वसामान्यपणे आनुवंशिक असते. कठोर परिश्रम करण्याची तयारी, धंद्यावरील निष्ठा आणि परस्पर सहकार्याची भावना यामधून हे नैपुण्या साध्य होत असे. कला आनुवंशिक असल्याने धंद्यातील कसब बापातूनच मुलात उतरत असे. तसेच हा धंदाही पित्याकडून पुत्राकडेच जात असल्याने धंद्यातील जीवघेणी स्पर्धा टाळण्यास त्यामुळे मदत होत असे.
पैठणची पैठणी इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. तेव्हाही ती परदेशांत पाठवली जात असे. विणकरांचा इतिहास मोहेन्जोदडो-हडप्पा संस्कृतीमध्ये असल्याचा दाखला दिला जातो. सातवाहनकालीन महाराष्ट्रात ही कला जोपासली गेली. पैठणी हे 'महावस्त्र' पैठणचे कसे? एक संगती विचार करायला लावणारी आहे. त्याची नाळ उत्तर भारताशी जोडता येईल. बनारस या गावाचा उल्लेख धार्मिक लोक 'पुण्यभूमी काशी' असा करतात. तेथे 'बनारशी' तयार होते. तसेच पैठणला 'दक्षिण काशी' म्हणतात. तसेच महावस्त्र या भागातही असावे, असा या संगतीचा धागा! अर्थात याला ऐतिहासिक पुरावे नाहीत. मात्र, ही संगती संशोधकाला विचार करायला नक्कीच भाग पाडणारी आहे. पैठणीचा सर्व इतिहास मोरवंचीकरांना मुखोद्गत आहे.

या परैसरातील सातवाहनांच्या उदयाने सांस्कृतिक विकासाचे आगळे दालन खुले झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली येथील नागरीकरणास (urbanisation) गती प्राप्त होऊन तेर, नाशिक (गोवर्धन), भोगवर्धन, जुन्नर, कोल्हापूर (ब्रह्मपुरी) आदि नागरी केन्द्रांचा उदय झाला. सातवाहन घराण्यांनी या परिसरावर चार शतकाहून (२३० इ.स. पूर्व व ते २३० इ,स,) अधिक काळ राज्य केले. सातवाहन काळात लाभलेले राजकीय स्थैर्य आणि आर्थिक सुबत्ता नागरीकरण प्रक्रियेस पोषक ठरली. तसेच सातवाहन सम्राट व्यापाराबाबत अतिशय दक्ष होते. त्यांनी देशान्तर्गत व्यापारात सुसूत्रता प्रस्थापित करताच परदेशीय व्यापाराची (विशेषतः पाश्चिमात्य देशांशी) जोरदार आघाडी उघडली. अल्पावधीतच त्यांनी ग्रीक व रोम येथील बाजारपेठा हस्तगत केल्या. सातवाहनकालीन राजवटीत या व्यवसायाला स्थैर्य मिळाले असावे. कारण दोन हजार वर्षांपूर्वी टाकसाळ असणारा हा एकमेव राजा होता. त्यानंतर पैठणवर अनेकांची राजवट आली-गेली. तेव्हा व्यापारातील व्यवहार वस्तुविनिमयातच होत. पैठणचा उल्लेख 'सगुणक्षेत्र' असाही केला जातो. वेगवेगळय़ा उपासना पद्धतींच्या या शहरात मंगलमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून महावस्त्रे परिधान करण्याची पद्धत होती. त्यामुळे शालूंचा व्यापार बहरत गेला. पुढे त्याला 'पैठणी' असे नाव पडले. जरतारी वस्त्रांसाठी 'हिरण्यद्रपी' शब्द वापरला जाई. रेशमावर जरी आणि मोत्याचे नक्षीकाम केल्यास त्याला 'मणिचिरा' म्हटले जाई.

याच सुमारास (इ. स. ४५-४६ मध्ये) हिप्पोलसने मान्सून वाऱ्याचा (मौसमी वारे) शोध लावून त्याची व्यापारासाठीची उपयुक्तता पटवून दिली. त्यामुळे सातवाहनांच्या पश्चिमी व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हा सर्व व्यापार भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून होत असल्याने पश्चिम किनाऱ्याचे महत्त्व वाढले. आणि लवकरच या परिसराचे नागरीकरण होऊन तेथे भडोच, कल्याण, नालासोपारा, चौल आदि बंदरे उदयास आली. प्रस्तुत बंदरे सह्याद्री पर्वतातील घाटमार्गांनी देशावरील प्रमुख बाजारपेठाशी जोडली गेली. त्यामुळे देशभर व्यापाराचा विस्तार होण्यास मदत झाली.
पाश्चिमात्य बाजारामुळे सातवाहनांची फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. ही त्यांची समृद्धी क्षत्रप या त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना सहन झाली नाही. म्हणून कोकणपट्टीवर व सातवाहन साम्राज्यावर प्रखर हल्ले करून पाश्चिमात्य व्यापार ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तथापि गौतमीपुत्र या सातवाहन सम्राटाने क्षत्रपांचे समूळ उच्चाट्टान करून परराष्ट्रीय व्यापारातील आपली पकड मजबूत केली.
मान्सून वाऱ्याचा शोध व क्षत्रपांचा पराभव यामुळे सातवाहनांचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात वाढला. आणि त्यांच्या वैभवात भर पडली. व्यापारामध्ये प्रामुख्याने कापडाची फार मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. कापडामध्ये रंगी-बेरंगी सुती व रेशमी कापड, रेशीम व तलम कापडाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. व्यापार सातवाहनांना फायदेशीर असल्याने ग्रीस व रोममधून फार मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ दक्षिण भारताकडे येत होता. या वस्त्रानी पाश्चिमात्य जगाला वेडे केले होते. प्लिनी या समकालीन लेखकाने रोमन लोकांच्या या उधळेपणावर सडकून टीका केली आहे. हा ओघ थांबविण्यासाठी रोमन लोकसभेला या आयातीविरुद्ध प्रतिबांधात्म कायदे करावे लागले होते. आज परिस्थिती नेमकी उलटी झाली असून आपणास पाश्चिमात्य आयातीवर बंदी घालावी लागत आहे. यालाच इतिहास चक्राची उलटी गती असे म्हणावे लागेल. त्या काळात रोम शहराशी पैठणचा मोठा व्यापार होता. पैठणहून पाठवलेला माल डहाणू, नालासोपारा येथील बंदरांतून समुद्रमार्गाने जात असे. पैठणी पाठवण्याची विशिष्ट अशी पद्धत होती. बांबूच्या आतील पोकळ भागात पैठणी गुंडाळून बसवायची. मेणाने त्याला सील करायचे आणि त्यावर रंग, वजन, नक्षी आदी माहिती लिहून ती परदेशी पाठवली जात असे.

या वैभवाचे पडसाद समकालीन पाश्चिमात्य लेखकांच्या प्रवासवर्णानातून ठायी उमटलेले दिसतात. या परिसरातील वस्त्रोद्योग हे या समृद्धीचे मूलभूत कारण होते. आणि महाराष्ट्राने वस्त्रोद्योगात एकाधिकार प्रस्थापित केला होता. तसेच या कालखंडात पैठण हे सातवाहनांच्न्या राजधानीचे ठिकाण असून ते वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होते. याशिवाय तेर, नेवासा, जुन्नर, नाशिक आदि केन्द्रेही वस्त्रनिर्मितीमध्ये अग्रेसर होती. आजच्या रौप्यमहोत्सवी वर्षात या दोन हजार वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचे स्मरण करणे आपले कर्तव्य ठरते.
हालसातवाहनाच्या गाहासत्तसई या प्राकृत काव्य ग्रंथातून आपणास समकालीन वैभवाची व बस्त्रप्रावरणाची कल्पना येते. प्रस्तुत ग्रंथात सातशे शृंगारिक गाथा असून पैकी गाथा क्रमांक २५५ ते २६३ आपणास वीनकाम, रंगकाम, भरतकाम व शिवणकाम यांची तपशीलवार माहिती देतात.
सातवाहनकालीन नाशिक येथील शिलालेख या उद्योगातील समृद्धीची कल्पना येण्यास फारच उपयुक्त आहेत. याशिवाय पितळखोरा, कार्ले, भाजे, बेडसा, अजिंठा आदि लेण्यातील शिल्पावरून आपणास समकालीन वस्त्रांची कल्पना येण्यास मदत होते. भारतीय पारंपारिक पोषाखामध्ये प्रामुख्याने मागावरील तयार कपड्यांचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने साडी, शेला, धोतर, शाल, फेटा लुंगी पट्टी (scarf) आदि वस्त्रे येतात. सर्वसामान्यतः ही वस्त्रे सुती असत; कारण प्राचीन कालापासून हा परिसर कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
भारतीय स्त्री आणि पुरुष यांच्या पोषाखाचा विचार केल्यास त्यामध्ये फारसा फरक आढळत नाही. स्त्रिया चोळी कंचुकी वापरीत त्याऐवजी पुरुष उत्तरीय नांवाचे वस्त्र पांघरीत असत. पोषाखात एकंदरीत अधोवस्त्र, अंतर्वस्त्र आणि परिवस्त्र असे तीन घटक असत. पुरुष डोक्यावर फेटा गुंडाळीत तर स्त्रिया अंगावरुन ओढणी घेत असत. सुती कपड्यांशिवाय रेशमी कपडे वापरण्याची प्रथा होती. रेशमी कपड्यांवर जरतारी मीनाकारी करण्याच्या कामात येथील कारागीर आरंभापासून वाकबगार होते.. सुती आणि रेशमी कपडे रंगविण्याकडे लोकांचा कल होता. अजिंठा व बाग लेण्यातील नखरेल रंगीत चित्रे हि याची साक्ष होत. तसेच तलम वस्त्रे अतैशय लोकप्रिय होती. तलम वस्त्रे विणण्यात भारतीय कलाकार एकमेवाद्वितीय होता. शिल्पांनी उपरोक्त लेण्यातील शिल्पावर हीच वस्त्रे असल्याने शिल्पे अर्धनग्न किंवा नग्न भासतात. तथापि परिधान केलीली वस्त्रे अतिशय तलम असून त्याची जाणीव केवळ वस्त्रांच्या घड्यावरून होऊ शकते. एकंदरीत वास्तवाचा आभास निर्माण करणारा शिल्पी व वास्त्वात इतकी तलम वस्त्रे निर्माण करणार दोन्ही श्रेष्ठ होत.

तुलनात्मकदृष्ट्या रेशमी कापड महाग व केवळ श्रीमंतांनाच परवडणारे होते. आजही या स्थितीमध्ये फारसा बदल झालेला दिसता नाही. प्राचीन काळापासून स्त्रिया पोषाखाबाबत विशेष चोखंदळ वाटतात. त्यांची वस्त्रांविषयीची आवड, रंग-संगती व वस्त्र परिधान करण्याची पद्धती वाखाणण्यासारखी होती व आहे. साडी परिधान करण्याच्या अनेक पद्धती असून ते परिसरावर अवलंबून होते. सर्वसामान्यतः आठव्या शतकापर्यंत विकच्छ साडी आणि डोक्यावरून पदर प्रथा होती. नंतरच्या कालात ती नष्ट होऊन सकच्छ साडी घालण्यास प्रतिष्ठा लाभली. आणि आजही सकच्छ साडी आणि डोक्यावरून पदर हे महाराष्ट्रीय स्त्री -पोषाखाचे आगळे वैशिष्टय मानावे लागेल.
भारतीय पोषाखाचा विचार केल्यास ही पद्धती पारंपारिक असून त्यामध्ये बदल करण्यास फारसा वाव नाही. कारण ही वस्त्रे म्हणजे कमी अधिक लांबी रुंदीच्या मागावर तयार होणाऱ्या पट्ट्याच होत. यामध्ये शिवणकामास फारसे महत्त्व नाही. महाराष्ट्रही या पद्धतीस अपवाद नाही. तथापि भारतीयांचा जेव्हा परकीयांशी संबंध आला तेव्हा त्यांनी परकीयांचे कांही उपयुक्त वस्त्र प्रकार येथे रुढ करण्याचा प्रयत्न केला. आणि सम्राट अलेक्झांडरच्या आक्रमणापासून ब्रिटिश आक्रमणापर्यंत ही प्रक्रिया सातत्याने चालू असल्याचे दिसत. महाराष्ट्रात याचा आरंभ क्षत्रपांच्या आक्रमणापासून होतो. सातवाहन जेव्हा क्षत्रपांच्या संपर्कात आले तेव्हा सातवाहनानी त्यांचे कांही वस्त्रप्रकार आत्मसात केले. म्हणूनच आपणास नंतरच्या शिल्पकृतीमध्ये हा फरक जाणवतो. यामध्ये आपणास विजार, तंगविजार, शिरबंध, बंडी, झगा ( पायघोळ व अर्धा), पट्ट्यापट्ट्याची व फुलाफुलांची वस्त्रे आदि आढळतात.
सातवाहनोत्तर कालखंडातील वस्त्र प्रकारात थोड्याफार प्रमाणात बदल झाल्याचे बाणभट्ट, ह्युएनत्संग यांच्या लिखाणावरून व अजिंठा आणि बाग येथील चित्रलेण्यावरून जाणवते. आता स्त्रियांच्या अंगावर काठापदराच्या साड्या व अत्याधुनिक प्रकारची वस्त्रे आढळतात. सैनिकांनाही आता गणवेशामध्ये दाखविण्यात आले आहे. नंतरच्या शतकातही असाच पोषाख असावा असे मार्को-पोलो, इब्न-बतूता आदींच्या लिखाणावरुन वाटते.
सातवाहनांनंतर काही विणकर पश्चिम घाटात स्थलांतरित झाले, तर काही कारागिरांना वेगवेगळय़ा राजांनी सक्तीने स्थलांतरित केले. यादव राजवटीच्या काळात अनहिलपट्टणच्या राजाने पाचशे विणकरांना सक्तीने गुजरातला नेले. पुढे रघुजी नाईक नावाच्या सरदाराने श्यामदा वालजी या गुजराती व्यापाऱ्याला बोलावून त्याच्यामार्फत काही सवलती देऊन कारागिरांना येवलावाडी (येवला) येथे नेल्याचा संदर्भ मोरवंचीकरांच्या पुस्तकात आढळतो. अशा तऱ्हेने अनेक निष्णात कारागीर पळविल्याने पैठणची पैठणी मात्र जीर्णशीर्ण झाली.
मध्ययुगीन इस्लामी आक्रमणानी भारतीयांच्या वेशभूषेत कमालीचा बदल घडवून आणल्याचे स्पष्ट होते; कारण पोषाख विषयक त्यांच्या कल्पना भिन्न होत्या. तसेच त्यांच्या सौंदर्य-विषयक संकल्पानाही पूर्णपणे वेगळ्या होत्या. त्यांना अतिशय तलम, जरतारी व शिवलेल्या वस्त्रांची विशेष आवड हाती.. शिवाय ते राज्यकर्ते असल्याने त्यांचा कल नटण्या-मुरडण्याकडे अधिक होता. समाजात त्यांच्या आवडी-निवडी त्वरित रुजल्या गेल्या. त्यांच्याच रंगसंगतीला प्राधान्य मिळाले. ते प्रामुख्याने मध्याआशियातून स्थलांतरित झाले असल्याने त्यांनी आपल्या समवेत आपल्या देशाच्या पद्धतीही आणल्या होत्या. दक्षिणेतील इस्लामच्या आगमनाने कपड्यांच्या शिलाई व भरतकामास वेगळीच गती प्राप्त झाली. या प्रकारच्या वस्त्रामध्ये जामा, कोट, जॅकेट, स्कर्ट, पेटीकोट आदींचा समावेश होता.
याच कालखंडात हिंदू-मुस्लिम संस्कृतीमध्ये सुसंवाद निर्माण होऊन कांही नवे वस्त्र प्रकार रूढ झाले. तसेच या परिसरातील नागरीकरण प्रक्रियेस गती प्राप्त होऊन अनेक नवे केन्द्रे उदयास आली. यामध्ये गुलशनाबाद (नाशिक), दौलताबाद (देवगिरी),औरंगाबाद (खडकी), मोमीनाबाद (अंबाजोगाई), येवला, जालनापूर, शहागड, बाळापूर, पुणे, वाई, सातारा आदि प्रमुख होत.
मोगल सत्तेनंतर या परिसरात मराठ्यांचे राज्य निर्माण झाले (इ.स. १६३० ते १८२०) मराठ्यांना पारंपारिक हिंदू पोषाखाची विशेष आवड होती. तथापि त्यांनाही प्रस्थापित लोकप्रिय इस्लामी वस्त्र प्रकारांचा स्वीकार करावा लागला. या पार्श्वभूमीवर आपण या कालखंडातील वस्त्रप्रकारांचा मागोवा घेऊ या.
वाढत्या लोकसंख्येची गरज म्हणून या नवोदित नागरी केन्द्रातूनही वस्त्रोद्योगास आरंभ झाला. आणि थोड्याच कालावधीत येथील वस्त प्रकारांना राष्ट्रीय मान्यता लाभली. उदा. देवगिरी (आता दौलताबाद) तलम वस्त्रासाठी प्रसिद्ध होत. महंमद तुघलकास या तलम वस्त्रांनी व येथील कलाकारांनी मोहित केले म्हणून त्याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी येथे स्थलांतरित केली. देवगिरीचे दौलताबाद करण्यात आले (इ.स. १३२२) या स्थलांतरामुळे येथील लोकसंख्या वाढली म्हणून वस्त्रनिर्मितीस प्राधान्य देण्यात आले. आणि कलाकारांस विशेष सवलती देण्यात आल्या. त्यामुळेच या परिसरातील पैठण, बीड, कंधार, नांदेड, लातूर आदि केन्द्रे पुढे येण्यास मदत झाली.
अमीर खुश्रू या समकालीन कवीने तलम वस्त्रांचे वर्णन अतिशय मार्मिक शब्दात केले आहे. त्याच्या सांगायचे झाल्यास ‘चंद्राची मुलायम त्वचा म्हणजेच तलम वस्त्र होय’. शंभर यार्ड मलमल सुईच्या नेढ्यातून सहज पार जात होती. या परिसरातील रेशीमही तेवढेच लोकप्रिय व आकर्षक होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या लुतीमध्ये रेशमी वस्त्रांचे हजारो प्रकार होते.
देवगिरीप्रमाणेच इतर नएक केन्द्रामधून वस्त्र निर्मिती होत होती. या प्रत्येक केन्द्रात निर्माण अ होणाऱ्या वस्त्रांचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्या वस्त्रांस त्या केन्द्राच्या नांवाने ओळखळे जात होते. उदा. पैठणची पैठणी, शहागडची शहागडी, धनवडची धवडी. जैनाबादची जैनाबादी, कालिकातचे कॅलिको आणि मसोलची मस्लिन वगैरे.
महाराष्ट्रातील वस्त्रोत्पादन करणाऱ्या महत्वाच्या पेठा व त्यांचे वस्त्र प्रकार पुढे दिले आहेत.
औरंगाबाद हिमरू-मशरू
दौलताबाद मलमल
बाळापूर चंद्रकळा साडी
संगमनेर चंद्रकळा साडी
पैठण असावली किंवा पैठणी, पीताम्बर, किमखाब धोतरे
येवला पैठणी, जामदानी, पीताम्बर
तेर मलमल
शहागड शहागडी (साडी), धोतरे
नाशिक जरीकाठी साडी
नागपूर रेशमीकाठी धोतरजोडी
अमरावती पासोडी, साडी
सोलापूर खण, साडी, सुती कापड
तुळजापूर खण, साडी, सुती कापड
कोल्हापूर खण, सुती कापड
अहमदनगर सर्व प्रकारचे कापड
पुणे जरतारी साडी व इतर कापडा
धारवाड खण
पंढरपूर घोंगडी, पासोडी, पीताम्बर
अकोला पासोडी, शाल, साडी
बीड पासोडी, साडी
उपरोक्ल्त केन्द्राशिवाय कल्याण, रत्नागिरी,मालेगाव, जालना, सातारा,अ दामोळ, चांदवड, राजापूर ,वाई इत्यादि बाजार पेठातूनही सुती व रेशमी वस्त्रे तयार होत होती. या कालातील कांही महत्त्वाच्या व लोकप्रिय वस्त्रांचा आपण विचार करू या.
पैठणी
पैठणी साडी हा मध्यमयुगीन महाराष्ट्रातील लोकप्रिय साडी प्रकार होय. गर्भरेशमी वस्त्रावर सोन्या-चांदीच्या जरीची मीनाकारी केलेल्या काठा-पदराच्या साडी प्रकारास पैठणी म्हटले जाते. रेशमा प्रमाणेच सुतावरही जरतारी काम करण्याचा प्रघात होता. तथापि रेशमाचा मलायमपणा अशा प्रकारच्या सुती साडिमध्ये येत नव्हता. तसेच सुत आणि जर यांच्यामध्ये रेशमाइतका सुसंवाद निर्माण होत नव्हता.
पैठणीची वीण अत्यंत साधी असून हात किंवा पाय चाळ्यातील नक्षीकाम हे पैठणीचे खास वैशिष्ट्य होय. हे नक्षीकाम झाला किंवा जेकार्ड सारख्या आधुनिक यंत्रप्रकारांची मदत न घेता केले जाते हे विशेष होय. केवळ ताणा-बाणा धांग्याच्या सहाय्याने नक्षीकाम करण्याचे तैत्र विकसित करण्यात आले होते. ताणा म्हणजे आडवे धागे (weft).पैठणी वरीलनक्षीकाम उभ्या धाग्याच्या अनेकरंगी लडी वापरून (Extra weft technique) करण्यात येते. नक्षी सामान्यतः पदर व काठावर काढली जाते. नक्षीवरून रांगावरून व जरतारी कामासाठी वापरलेल्या सोन्याच्या वजनावरून पैठणीला निरनिराळी नांवे मिळाल्याने स्पष्ट होते.

उत्तर पेशवाईमध्ये पैठणीस कमालीची लोकप्रियता लाभली होती. मराठा काळातील पैठणीवर ‘असावली’ च्या फुलांचे सुंद्र नक्षीकाम केलेले आढळते. म्हणून त्य साडिला असावली साडी नांवही प्रापत झाले होते. महाराष्टातील हे सर्वात किमती वस्त्र असून त्याची किंमत वापरण्यात आलेल्या सोन्याच्या वजनावरून ठरत असे भरजरी नक्षीचा पदर व उठावदार काठ ही पैठणीची खास वैशिष्टये मानावी लागतील. या पदरावर सामान्यतः असावली, अक्रोटी, गझवेल, बांगडीमोर, शिकार-खाना, अजिंठा-कमळ, ह्भा परिदा अशा प्रकारची नक्षी काढली जात असे. कांही पैठण्यावर जरतारी बुट्टी विणल्याचे आढळते. अशा साडीला बुट्टीदार पैठणी किंवा शालू म्हणत असत. गडद रंगाच्या पैठणीला शालू म्हटले जात असे. गडद हिरव्या रंगाचा व भरजारी काठा पदराचा शालू या काळात अतिशय लोकप्रिय असल्याचे आढळते. अशा प्रकारच्या शालूची लोकप्रियता स्त्रीजगतामध्ये शिंगेस पोहोचल्याचे दिसते. स्त्रियांचे या शालू विषयीचे आकर्षण हा काव्यसृष्टीतील महत्त्वाचा विषय होता. हिरव्या शालूचे धार्मिक सभारंभात अतिशय महत्त्व होते.
पेशवे दप्तरातील अनेक पत्रांवरून पेशव्याना पैठणच्या पैठणीचे व अन्य वस्त्रांचे खास आकर्षण असल्याचे स्पष्ट होते. ७-१२-१७६८ च्या एका पत्राद्वारे श्रीमंत माधवराव पेशवे यांनी असावली दुप्पट्टे, तसेच तांबड्या, हिरव्या, केशरी व डाळिबी रंगाची वस्त्रे मागविल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे ४-१२-१७६६ पत्राद्वआरे माधवरावांनी आपणास धोतराच्या काठावर ज्या प्रकारची नक्षी हवी आहे ती नक्षी स्वहस्ते काढून पाठविली आहे.
नंतरच्या काळात हैद्राबादच्या निजामानेही पैठणी साडीच्या खरेदीसाठि अनेक वेळा भेटी दिल्या होत्या. निलोफर या निजामाच्या सुनबाईने पैठणला भेट देऊन पैठणीमध्ये कांही सुधारणा सुचविल्या होत्या.
कालीघात पैठणी ही लग्नसभारंभात आवश्यक बाब बनली. राजापासून ते सर्वसामान्यापर्यंत सारे जण लग्न सभारंभात पैठणीसाठी हट्ट धरत असत. त्यामुळे पैठणीची मागणी वाढली. या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्याच्या हेतूने अनेक केन्द्रावर पैठणी विणली जाऊ लागली. अशा केन्द्रापैकी येवले हे केन्द्र बरेच नांवारूपास आले. कोयरी पदर हे येवल्याच्या पैठणीचे वैशिष्टय होय. येवल्याशिवाय, पुणे, नाशिक, मालेगाव येथील पैठण्याही प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्र संस्कृतीचे भिन्न धागे एकत्र करण्यात पैठणीचा सहभाग मोठा आहे.
जामदानी
भारतीय कलाकारांची अत्यंत वैशिष्टयपूर्ण कलाकृती म्हणजे जामदानी होय. तसेच पाहता जामदानीची वीण अत्यंत साधी व सोपी असते. तथापि ताण्यावर (warp) नक्षी जोडण्याचे काम अत्यंत कौशल्याचे व दीर्घ मुदतीचे असते. यासाठी निष्ठा आणि चिकाटी या दोन गुणांची आवश्यकता असते. औरंगजेबास जामदानीचे खास आकर्षण होते म्हणून या वस्त्र प्रकारास नंतर औरंगजेबी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. केवळ शासनमान्य कलाकारच जामदानीचे विणकाम करू शकत असत.
हिमरू
हा मुस्लिम जगातातील लोकप्रिय वस्त्र प्रकार होय. ही भरजरी किमखाब या वस्त्राची प्रतिकृती होय. याचे मूळ नांव हमरू असून. हमरू म्हणजे प्रतिकृती. दक्षिणेमध्ये महंमद तुघलकाने सर्वप्रथम हे वस्त्र प्रचारात आणले. यामध्ये रेशीम व सूत यांचे मिश्रण परस्परात मिसळलेले असते. यापासून सर्व प्रकारची वस्त्रे बनविली जात होती. या प्रकारात रेशमाचे प्रमाण अधिक असल्याने ते मुलायम व किमती होते. म्हणून ते सर्वसामान्याना परवडणारे नव्हते. दौलताबाद, औरंगाबाद, पैठण, जालना येथे पूर्वी याची निर्मिती होत होती. आता हिमरू केवळ औरंगाबाद येथेच तयार होते.
मशरू
>ही हिमरूची सर्वमान्य प्रतिकृती होय. यामध्ये सुताचे प्रमाण अधिक असल्याने ते सर्वाना परवडणारे होते. शुद्ध रेशमी वस्त्र परिधान करून प्रार्थना करण्यास प्रेषितांनी प्रतिबंध घातल्याने मशरू या वस्त्राची निर्मिती करण्यात आली. केवळ प्रार्थनेसाठी म्हणून हे वस्त्र मोठ्या प्रमाणात वापरले जात होते.
किमखाब
सोन्याच्या जरीची भरपूर मीनाकारी असलेले दक्षिणेतील एके काळचे लोकप्रिय सोनेरी वस्त्र होय. हे अतिशय किंमती राजेशाही वस्त्र असून त्याच्या निर्मितीस कठोर परिश्रम व बराच कालवधी लागत असे. एका पर्शियन राजदूतास हे वस्त्र प्राप्त करण्यासाठी पाच वर्षे थांबावे लागले होते. कारण या वस्त्राचे वीणकाम पैठणच्या हातमागावर चालू होते.
फेटा
डोक्याला गुंडाळण्याचे पुरुषांचे वस्त्र म्हणजे फेटा. फेट्याचे विविध प्रकार असून त्याला पगडी असेही म्हटले जात होते. बुट्टीदार पगडी हा पगडीचा लोकप्रिय प्रकार असून हिंदू आणि मुस्लिम याचा वापर करीत असत. जोरदार पगडी. खिडकीदार पगडी, नस्तालिक हे पगडीचे कांही लोकप्रिय प्रकार होत.
मंदिल
हा मलमली कापडाचा फेटा असून त्यामध्ये सोनेरी जर वापरला जात असे.
शंमला
हा फेट्याचा एक वेगळा प्रकार होय. बत्ती, सरबत्ती, सरबंद हे शिरोवस्त्राचेच भिन्न प्रकार होत. सर म्हणजे शिर व बंद म्हणजे बांधणे किंवा गुंडाळणे. तिवटे किंवा तिवट हा व्यापारी वर्गातील लोकप्रिय पगडी प्रकार होय.
रूमाल
हाही फेट्याचाच एक चौरस प्रकार होय. डोक्याला गुंडाळण्यासाठी याचा वापर केला जात होता.
दुपट्टा
खांद्यावर घेण्याच्या पट्टीस दुपट्टा असे म्हणतात. याच्या काठावर जरीकाम केलेले असते.
शेला
अंगावर घेण्याची एक किमती वस्त्र.
मेहमुदी
एक प्रकारचे सुती सफाईदार वस्त्र.
साडी
स्त्रियांच्या पोषाखातील प्रमुख घटक.
चंद्रकळा
एकरंगी रेशमी किंवा सुती साडी. काळी चंद्रकाळ सर्वात प्रसिद्ध होती.
खण
चोळीसाठी तयार केलेला खास वस्त्र प्रकार.
पीतांबर
पुरुषासाठी धार्मिक सोहळ्याच्या प्रसंगी परिधान करायचे रेशमी व जरतारी काठाचे महावस्त्र. याचे काट तुलनात्मक दृष्ट्या छोटे असून याला पदर नसतो. यालाच सोवळे, मुकटा म्हटले जात असे. येवले पीतांबरासाठी प्रसिद्ध होते.
कुर्ता किंवा कुडता
सैल झग्यासारख्या वस्त्र प्रकार. खमीज मुस्लिम वस्त्र प्रकार.
अंगरखा
जाम्याखाली वापरण्याचा वस्त्र प्रकार. मिना किंवा अंगी हे कुडत्यायेच भिन्न प्रकार होत.
मिरजी
डगला, कुफचा, कुबा हे अंगरख्याचे आणखी प्रकार होत.
जामा
मुस्लिम वस्त्र प्रकार.
पेशदार
रंगीत मलमलीपासून तयार करण्यात आलेले मुस्लिम परिवस्त्र.
लहंगा, कंचुकी
ही स्त्रियांची अर्न्तवस्त्रे होत.
या परिसरातील वस्त्रोद्योगास मुस्लिमानी पाठिंबा दिला. याशिवाय त्यांनी कांही लोकप्रिय वस्त्रप्रकारही रूद केले. महमुदी, जाफरखानी, औरंगजेबी, नाफरमानी इ. मुस्लिम बनली असल्याचे पेशवे दप्तरावरून स्पष्ट होते.
रंगकाम
भारतीयांना झळाळणाऱ्या रंगांचे खास आकर्षण आहे. त्यांची रंगांची आवड ही सामान्यतः परिसरावर अवलंबून आहे. कपड्यासाठी वनस्पतिज रंग वापरले जात होते. उदा. गोदावरी काठ आढळणाऱ्या लाखेपासून तांबडा रंग तयार केला जात असे. बाभळीच्या साली पासूनही रंग तयार होत होते. काळा, हिरवा, निळा हे रंग वरील रंगांत नीळ मिसळून करीत असत. सर्वसामान्यपणे पिवळा, जांभळा, नारिंगी, हिरवा, गुलाबी, विटकरी, काळा आणि तपकिरी हे रंग अधिक प्रमाणात वापरात होते.
भरतकाम
वस्त्रांना खुलविण्यासाठी, सुशोभित करण्यासाठी वस्त्रांवर भरतकाम केले जात असे. भरतकाम सुती व रेशमी अशा दोन्ही प्रकारच्या वस्त्रांवर केले जाई. अगदि प्राचीनकालापासून भरतकाम करण्याची कला भारतीयांनी आत्मसात् केली होती. प्राचीन साहित्यामधून भरतकामाचे अनेक संदर्भ मिळतात. पैठणी आणि जामदानी वस्त्रें त्यांच्या जरातारी मीनाकारीसाठी प्रसिद्ध होती. युरोपीय देशामध्ये अशा प्रकारच्या वस्त्रांना फार मोठ्या प्रमाणात मागणी होती. तथापि १७०७ मध्ये ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदा करून भारतीय कापडाची आयात पूर्णतया बंद केली. त्यामुळे भारताच व्यापार बसला. आणि व्यापार बसल्याने भारताची सुबत्ता नष्ट झाली.
आता ही प्रारंपारिक कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता विज्ञानाने व तंत्रज्ञानाने वीणकाम, रंगकाम, भरतकाम, जरीकाम आदि अद्ययावत केले आहे. तथापि मानवाच्या अविरत श्रमातून साकार झालेल्या कलेची बरोबरी यंत्र करू शकणार नाही.

सूक्ष्म कलाकुसर असलेली पैठणी तयार करणारे कुशल कारागीर आता दुर्मीळ होत चालले आहेत. पैठणींचे उत्पादन आणि विक्री यांच्यात जोवर समन्वय निर्माण होत नाही, तोवर तिच्या नशिबीची उपेक्षा संपणार नाही. महाराष्ट्राचे हे महावस्त्र देशी-विदेशी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारी पातळीवरही विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..' या गाण्याला सुमारे ४८ वर्षे झाली असतील. तमाशापटांचा तो काळ. जगदीश खेबूडकरांची गीतकार म्हणून तेव्हा नुकतीच ओळख निर्माण होऊ लागलेली. आता 'गदिमां'ची गाणी मागे पडतील, अशा कंडय़ा पिकवल्या जाऊ लागलेल्या. त्या काळात 'मल्हारी मरतड' चित्रपटातील 'गदिमां'च्या या लावणीने बाईपणाच्या भावनांचा ज्या नजाकतीने ठाव घेतला, त्याचे गारुड आजही कायम आहे. 'गदिमां'च्या लावणीतील 'नाचरा मोर' पैठणी विणकरांच्या विश्वात मात्र 'बांगडीमोर', 'साखळीमोर' या नावाने ओळखला जातो. पैठणी विकत घेणाऱ्यांसाठी मोराचे नाचरेपण लोभस असले तरी हे नक्षीकाम करणाऱ्यांच्या आयुष्याची वीण मात्र उसवलेलीच दिसते. पैठणीचा भवताल म्हणजे श्रीमंती आणि गरिबी यांमध्ये हिंदूोळे घेणारा जणू लोलकच! पैठणीचे आडवे-उभे धागे मोठय़ा गुंतागुंतीचे. हा तानाबाना नक्की कसा? तर- एका पैठणीत तब्बल उभे चार हजार धागे! काठापदरावर रेशीमनक्षी आणि जरतारीची एकेक वीण करायला कधी दोन महिने लागतात, तर कधी वर्ष-सव्वा वर्षही लागते. पदरावर नाचरा मोर वर्षांच्या आत कधी चितारताच येत नाही. काही पैठणींची जरतारीएवढी अस्सल, की अंधारातही तिचा लख्ख उजेड पडावा! पैठण येथील मीराबाई शेळके यांचे सोनेरी जर आणि रेशमी धाग्यांशी नाते जडून झाली असतील वीसएक र्वष. नवऱ्याचा व्यवसाय बूटपॉलिशचा. दोन मुले. घर चालवायचे तर काम करणे अपरिहार्य. १९९० मध्ये पैठणमध्ये पुन्हा एकदा विणकामाचे प्रशिक्षण सुरू झाले. पैठणीची वीण घालायला त्या शिकल्या. दोन मुले शिकली. एक दहावीपर्यंत; तर दुसरा त्यांच्या भाषेत चौदावीला. सकाळी दहापासून संध्याकाळपर्यंत मीराबाई कितीतरी प्रकारचे काम करतात. त्या वापरत असलेल्या हातमागावरील यंत्राचे सुटे भागदेखील सहज लक्षात ठेवता येत नाहीत. प्रत्यक्ष विणकाम करण्यापूर्वी कितीतरी किचकट काम करावे लागते. सिमेंटच्या चार गट्टवर चार लोखंडी सळ्या बसवलेल्या. त्याला रेशमी धागा गुंडाळला जातो. त्याला 'धापा' म्हणतात. धाप्यावरचा धागा आसारीवर घ्यायचा. पतंगाला लागणारी आसारी जशी, तशीच ही. पण आकार जरा मोठा. त्यानंतर आसारीवरचा धागा 'तनसाळ'ला गुंडाळायचा. एका लाकडी चौकटीला खुंटय़ा ठोकलेल्या. फणीचा आकार म्हणता असे हे तनसाळ. १८० धाग्यांचा वेढ तयार केला जातो. त्याला 'गुढा' म्हणतात. असे १८ गुढे तुराईवर घ्यायचे. 'तुराई' हा हातमागाचा एक भाग. रेशमी धागा उकलून तो तुराईवर आणण्यासाठी निष्णात कारागीराला तीन दिवस लागतात. कारागीर नवखा असेल तर दहा दिवस. नव्याने प्रशिक्षण घेणाऱ्याला एवढे शिकायला किमान महिनाभराचा कालावधी तरी लागतोच. अशा गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून पैठणीची 'जोडणी' करावी लागते. ही जोडणी झटपट करून देणारे कारागीर एका हातमागासाठी ५०० रुपयांपर्यंत मानधन घेतात. मीराबाईंसारख्या कितीतरी महिला ही कलाकुसर करतात. फर्जाना शेख मीराबाईबरोबर काम करतात. त्यांचे यजमान चपलांच्या दुकानात काम करतात. त्यामुळे फर्जाना यांना काम करावे लागते. दिवसभर मान मोडून काम केल्यावर महिन्याला केवळ तीन हजार रुपये मिळतात. त्यांनी तयार केलेली पैठणी मात्र २० हजारांपासून ते तीन लाखांपर्यंत विकली जाते. पैठणीची कमीत कमी किंमत सात हजार रुपये. जेवढी जरतारी अधिक; तेवढा त्याचा दर अधिक. जेवढे रंग अधिक; तेवढा विणकामाचा वेळ अधिक. विणकामात प्रत्येक रंगाच्या धाग्याचा एक 'काकडा.' कापडी गुंडाळीला 'काकडा' म्हटले जाते. या काकडय़ाला गुंडाळलेले नाना रंगसंगतीचे धागे. जरतार वेगळी. पैठण शहरात तारकशी करणाऱ्यांची पूर्वी एक गल्लीच होती. सोन्या-चांदीच्या धातूपासून केसांच्या आकाराची तार करणारी ही मंडळी आता नाहीतच असे म्हणायला हरकत नाही. 'पावटे' हा शब्द आपण ऐकला असेल. तार लांब करण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. धातूपासून तार करण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व जल-अभ्यासक डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांच्या 'दक्षिण काशी पैठण' पुस्तकात आढळतो. सोन्या-चांदीची केसासारखी बारीक तार तयार करण्याची प्रक्रिया पुन्हा गुंतागुंतीची आहे. सोनार, तारू किंवा तरकसे, पटवेकरी असे कितीतरी कारागीर या प्रक्रियेत पूर्वी असायचे. आता तो व्यवसाय करणाऱ्यांची काही आडनावे आणि काही आळीची नावे तेवढी शिल्लक आहेत. २२० यार्ड लांबीची तार ४० हजार यार्ड लांबीच्या धाग्यांमध्ये रूपांतरित केल्यानंतर जरतारी तयार होते. यार्ड आणि मीटरमध्ये ०.९० चा फरक! अलीकडे जरतारी परराज्यांतून विकत आणली जाते. पैठणीसाठी लागणारे कच्चे साहित्य कर्नाटक व गुजरातमधून आणले जाते. कर्नाटक सरकारने रेशीम उद्योगाला मोठी चालना दिली. हा कच्चा माल तसा महागडा. जरतारी ३२०० ते ३४०० रुपये किलो आणि रेशीम किमान हजार रुपये किलो. एक पैठणी करायची असेल तर किमान १६० ते ३५० ग्रॅम जरतार वापरली जाते. जरतार जेवढी अधिक, तेवढी किंमत अधिक. संसार सांभाळून हातमागावर पैठणीचे विणकाम करणारे कारागीर कमीच झाले आहेत.
आज मात्र पैठणला उतरती कळा लागली आहे. एकेकाळचे ऐश्वर्यसंपन्न शहर आज रस्त्यावरच्या फुफाट्यात आणि कचऱ्याच्या साम्राज्यात सापडले आहे. सुधारणेच्या नावाखाली कॉक्रीटीकरण झालेल्या अनेक वास्तु शहरात पाहायला मिळतात. उदाहरणच द्यायचे झाल्यास सातवाहनकालीन नागघाट. याच घाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले. या घाटाचे महत्व सांगणारा याहून दुसरा दाखाला देण्याची गरज नसावी. घाटाचे कॉक्रीटीकरण हि सुधारणा नसून जाणूनबुजून घातलेला हातोडाच नव्हे का.
शेतीच्या आणि तत्सम उद्योगधंद्यात पैठण प्रगतीपथावर असले तरी मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात रस्त्यांचा अभाव घाणीचे साम्राज्य यामुळे पर्यटक पाठ फिरवतात.
दक्षिण काशीचे आजचे हे रूप बदलणे गरजेचे आहे.
.JPG)
पैठणपासून ६ किलो मीटर अंतरावर वडवाली गावातले बालाजी मूर्ती
वडवाडीचा बालाजी :-
पैठणपासून सहा कि.मी. अंतरावर वडबाळी नावाचे गाव आहे. श्री क्षेत्र वडवाडी येथे प्राचीन बालाजी मंदिर असून या बालाजी मंदिराला राज्य शासनाने अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेअंतर्गत ब दर्जा प्रदान केला आहे श्री क्षेत्र वडवाळी येथील बालाजी मंदिराला राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक भेट देतात या मंदिराला ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे तिथे गोदा किनारी टेकडीवर बालाजीचे भव्य मंदीर आहे. हा परिसर अतिशय रम्य आहे. तिथेच एक वडवानलेश्वर महादेव मंदीर देखील आहे. या मार्गावरील दगडी कोरीवकाम वेरुळ लेण्याची आठवण करुन देणारे आहे.
.jpg)
साईं गणपती , धुपखेडा :-
धुपखेडा हे पैठण -छत्रपती संभाजीनगर सत्यावर वसलेल छोटेसे गाव आहे. साईबाबांच्या चरित्रात पाचव्या अध्यायात या गावाचे नाव येते. धुपखेडा गावातील चांद पटेल यांची घोडी हरवली होती, तीचा शोध घेत चांद पटेल जंगलात गेले. त्यावेळी चांद पटेल यांना साईबाबांचे दर्शन झाले. घोडी शोधण्यासाठी साईबाबांनी चांद यांना मदत केली. त्यावेळी चांद पटेल यांनी या १३ वर्षाच्या मुलाला साई अशी हाक मारली. ते म्हणाले, 'चल साई, घरी चल'. साईबाबांच्या मदतीमुळे चांद पटेल यांना हरवलेली घोडी सापडल्यामुळे आनंदाने त्यांनी साईबाबांना घरी आणले. मात्र साईबाबा पटेल यांच्या घरी न रहाता गावाबाहेर असलेल्या एका कडुनिंबाच्या झाडाखाली राहिले. खुप दिवस साईबाबा धुपखेडा गावात राहिले. चांद पटेल यांच्या भाच्याच्या लग्नानिमीत्ताने साईबाबा शिर्डीला गेले, ते कायमचे. त्यामुळे साईबाबांची आठवण या गावातील सर्व गावकरी साईबाबांची आजही आराधना करतात. यासाठी गावकर्यांनी गावात हे साई गणपतीचे मंदीर उभारले आहे, ज्यामध्ये सहा फुट उंचीची गणपतीच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे, जीचे मस्तक गणेशाचे आहे तर बाकी शरीर साईबाबांचे आहे.
रेणुकादेवीच्या मंदिर, हिवरा चौंढाळा :-
हिवरा चौंढाळा (ता. पैठण) येथे श्रीक्षेत्र माहूरगडावरील रेणुकामातेचं उपपीठ आहे. इतर देवस्थानांच्या तुलनेत येथे काही घालून दिलेल्या प्रथा, रुढी परंपरांचे येथील सर्वधर्मीय समाज आजही काटेकोरपणे पालन करतात. येथील देवी ही कुमारिका असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे चोंढाळा गावात लग्न समारंभ न करता वेशीबाहेर गावाला लागून असलेल्या विहामांडवा शेत शिवारातील मारुती मंदिर परिसरात पार पडतात. विशेष म्हणजे, रेणुकामाता ही बाजेवर निद्रा करते. या आख्यायिकेमुळे येथील ग्रामस्थ बाज, पलंग, दिवाण झोपण्यासाठी कधीच वापरत नाहीत. घरामध्ये तयार केलेल्या सिमेंट किंवा मातीच्या ओट्याचा वापर झोपण्यासाठी केला जातो, ही परंपरा आजतागायत सुरूच आहे.
गावातील देवीच्या मंदिराला कळस नाही. त्यामुळे मंदिरापेक्षा उंच घर किंवा दुमजली घर येथे बांधण्यात येत नाही. त्यामुळे एकही दुमजली घर नाही. रेणुकामातेचा विवाह करण्याचा घाट एका राक्षस राजाने (राक्षसी वृत्ती) घातला होता. तेव्हा देवदेवतांना प्रश्न पडला होता की, या राक्षसाबरोबर रेणुकेचा विवाह झाला तर अनर्थ होईल, अराजकता माजेल तेव्हा हा होणारा विवाह होता कामा नये. तोपर्यंत इकडे चोंढाळा येथे विवाहाची तयारी पूर्ण झाली होती. वऱ्हाडी स्थळी आले, तोपर्यंत तिथे उपस्थित वऱ्हाडी शेवटची घटका मोजत होते. त्याच वऱ्हाडी मंडळींचा पाण्याअभावी मृत्यू होऊन दगडी शिळेत रूपांतर झाले.
हिवरा चौंढाळा येथे रेणुकादेवीच्या मंदिराशिवाय दुसरे कोणतेच मंदिर गावात नाही. नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. दहाव्या दिवशी दसरा सणाने सांगता होते.
रेणुका मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच समोर गाभाऱ्यातील रेणुकामातेचा भव्य तांदळा असून चोंढाळा देवी, रेणुकामाता, जगदंबा देवी, अशा विविध नावाने ही देवी ओळखली जाते. नवरात्री व चैत्र पौर्णिमेला अशी वर्षांतून दोनदा येथे यात्रा भरते. या दोन्ही सोहळ्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर
आपेगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

‘आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाव आहे. हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्म गाव होय. पैठण तालुक्यापासून आपेगाव १० किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे.
विश्वात्मक देवा’कडे अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे आणि ‘ज्ञानेश्वरी’ हा श्रीमद्भगवद्गीतेवरील मराठी टीकाग्रंथ लिहून सर्वसामान्यांपर्यंत अध्यात्मज्ञानाची गंगा आणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तसेच त्यांचे ज्येष्ठ बंधू व गुरू निवृत्तीनाथ, कनिष्ठ बंधू सोपान आणि भगिनी मुक्ताबाई यांचे आपेगाव हे जन्मस्थान. पुढे ज्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी दीक्षा दिली,
त्याच पर्वतातून उगम पावणाऱ्या गोदावरीच्या विस्तीर्ण पात्राशेजारी हे गाव वसलेले आहे. तेथे ज्ञानेश्वर महाराजांचे पाषाणशिळांतून बांधलेले मंदिर प्रसिद्ध आहे.
विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांच्या पोटी निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ता ही चार अपत्ये जन्माला आली ती आळंदी येथे, असा समज पूर्वी रूढ होता. मात्र त्यांची जन्मभूमी आपेगाव हीच असल्याचा दावा करण्यात येत होता. त्यावर आपेगाव संस्थानचे प्रमुख ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची जन्मभूमी ही आळंदी वा पैठण नसून आपेगावच असल्याचा निकाल विविध पुरावे आणि नोंदी पारखून दिला होता. त्यास आता ४० वर्षे उलटून गेली आहेत. या गावामध्ये संत ज्ञानदेवांचे पुरातन मंदिर आहे. या प्राचीन मंदिराच्या बाजूला आता नवीन दगडी मंदिर बांधण्यात आले आहे.

प्राचीन इतिहासानुसार, हरिपंत कुळकर्णी हे यजुर्वेदी ब्राह्मण आपेगावचे कुळकर्णी होते. ते ज्ञानेश्वरांचे ज्ञात पूर्वज तसेच पणज्यांचे पणजे होते. त्या घराण्यातील गोविंदपंत व त्यांची पत्नी निराई यांचा विठ्ठल हा पुत्र होय. थोडे या घराण्याच्या मुळ पुरुषाबद्दल लिहित असतांना शके ११२९ ते ११३५ च्या काळात जावे लागेल. भक्त त्रिंबकपंतांचे वडील गोपाळपंत जावळे (कुलकर्णी) त्रिंबकपंतांनी देवगिरी (देवगड) येथे जाऊन वेद अध्ययन केले. देवगिरीवर असणारे जाधवराजे (सिंव्हल) यांच्या सेवेत सात वर्ष देश अधिकाऱ्याचे बीडला काम केले. त्याकाळचा सार्वभौम राजाचा जैत्रपालाने (जैतुगीने) शके ११२९ प्रभोनाम संवत्सरे चैत्र शुक्ल ५ इंदुवासर प्रात:काल घटी ११ यावेळेस ही राज अज्ञा त्रिंबकपंतांना दिली.
त्याच प्रमाणे त्रिंबकपंतांनी दोन वर्ष सुखाने राज्यकारभार पाहिला. पुढे तीन वर्ष दुष्काळ पडून त्रिंबकपंतांचे फार नुकसान झाले. लोकांना जगवण्यात राज्याचा पैसा संपला. स्वत:चे सर्व द्रव्य खर्ची पडले. त्यांनी स्वत:ची इस्टेट विकून प्रजेचे पोषण केले. त्रिंबकपंतांना दोन मुले होती. गोविंदपंत व हरिहरपंत, वडील मुलगा गोविंदपंत अपेगांवचे कुलकर्णीपणाचे काम पहात होता. इकडे देवगिरीच्या जैत्रपालाचे मृत्युनंतर त्यांचा पुत्र सिंघन (सिंव्हल) राजा गादीवर बसला. शके ११३२ त्याने त्रिंबकपंतांचा लहान मुलगा हरिहरपंत यास दुय्यम सेनापतीपदी नेमले. पुढे दक्षिणेत देवगिरीपासून चाळीस कोसावर बालाघाट आहे. त्यास करंजे आडनावाचे देशमुख राहत असत. त्यांनी सरकार विरुध्द बंड पुकारले. राजद्रोह मांडला. तीन हजार लोक साथीला घेऊन वारेमाप वाटसरुंची व खेडोपाड्याची लयलुट करु लागला. त्याला आळा घालण्यासाठी देवगिरी नराधिप सिंघनराज महाराज यांनी शके ११३५ यांची हरिहरपंतांना राजअज्ञा पत्र पाठविले.
त्या अज्ञेनुसार जसवंतसिंह,हरिहरपंत व त्यांचे वडील त्रिंबकपंत देशमुखांशी लढाई करुन बंड मोडले. लढाईच्या जबर घावांनी हरिहरपंतांचा देह धारातीर्थी पडला. होतकरु पुत्राचा लोप झालेला पाहून त्रिंबकपंतांना वैराग्य प्राप्त झाले. त्यांनी नौकरीचा राजीनामा दिला व परत आपेगांवी येऊन गोदावरी गंगेकाठी बारा वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळेला गोरक्षनाथांनी त्रिंबकपंतांना अनुग्रह दिला. पुढे तिन्ही देव प्रसन्न झाल्यावर मागणीसाठी आज्ञा केली असता. त्रिंबकपंतांनी देवापुढे मागणे मागितले ते विश्व कल्याणासाठी चंद्र,सूर्य,पृथ्वी असे पर्यंत संजीवन स्वरुपातून माझे कुळात मृत्यु हा शब्द नको व तुम्हाला माझ्या कुळात जन्म घ्यावा लागेल. पुढे त्रिंबकपंतांना गोरक्षनाथांनी स्वत: संजीवन समाधी दिली. मोठा मुलगा गोविंदपंत पंढरपूर वारी करीत असतांना वृध्दापकाळाने सोलापूर येथे सिध्देश्वर मंदिरात अत्यावस्थस्थिती पांडूरंगाचा मनात धावा करीत वारी अर्धवट राहिल्याची खंत मनात बाळगत प्राण कंठाशी येऊन ईश्वराचा धावा करत होते. तेथे प्रत्यक्ष पांडूरंगाने भेट देऊन त्यांना स्वत: संजीवन समाधी दिली. याचा संपूर्ण उल्लेख "इंडियन गॅझेट'मध्ये १९३ पानावर आहे. पुढे विठ्ठलपंत हे सर्व आपेगांवचा कुलकर्णीपणा सांभाळत होते. मनात ईश्वराची ओढ सर्व विद्या पारंगत आणि एके दिवशी घरातून निघून पुढे काशी यात्रा केली.

या विठ्ठलपंतांना तारुण्यातच वैराग्य, भक्ती व ज्ञान उत्पन्न होऊन ते तीर्थयात्रेस गेले. आळंदी येथे त्यांची तेथील थोर ब्राह्मण सिद्धोपंत यांच्याशी भेट झाली. सिद्धोपंत यांच्या आश्रमातच विठ्ठलपंत राहिले. नंतर सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र ते प्रवृत्तीने विरक्त संन्यासी असल्याने त्यांनी सन्यास घेतला व ते काशीस गेले; परंतु तेथे त्यांच्या गुरूंस ते विवाहित असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची आज्ञा केली, गुरुआज्ञेवरुन परत गृहस्थाश्रम, आळंदी येथे वास्तव्य असतांना तेथील ब्रह्मवृंद्यांनी सिध्दोपंतांना (सासरे) बजावून सांगितले, सन्याशी परत गृहस्थाश्रम कोणाच्या आज्ञेने स्वीकारला त्याचे तोंड पहाणे नाही. तो भ्रष्ट आहे. त्याला येथून हाकलून लावा. नाहीतर समाजातून तुम्हाला दूर जावे लागेल. हे सर्व वृत्तांत विठ्ठलपंतांना समजल्यावर विठ्ठलपंत रुख्मीणीआईसह आळंदीहून आपेगांवी आले. शुध्दीपत्रासाठी खूप वणवण केली. जीवाची खूप परवड झाली. समाजात मान नाही. आत्मतत्वातून ईश्वरचिंतन फक्त. विश्वकल्याणासाठी जन्मघेणाऱ्या ईश्वर अवतारासाठी जगणे आले. ""ऐशी बारा वर्ष क्रमिली निघूते। झालीसे संतती चौघे जण।।'' बारा वर्ष कष्टमय जीवन जगत वयाच्या ४६ व्या वर्षी कैलासपती भगवान शंकर निवृत्तीनाथ रुपाने माता रुख्मीणीआईच्या कुशीत जन्मले, ""सदाशिवाचा अवतार। स्वामी निवृत्ती दातार।।'' शके ११८५ श्रीमुख संवत्सर माघ वद्य प्रतिपदा प्रात:काळी वार सोमवार जन्म घेतला. (माघ शुद्ध प्रतिपदा, शके ११९५, सोमवार, इ.स. १२७३), पुढे दोन वर्षांनी ज्यांच्यासाठी देव,देवांगणा,ऋषिमुनी,सिध्दसाधक अतुरतेने वाट पहात होते ते शके ११९७ युवा संवत्सरनाम श्रावण वद्य अष्टमी गुरुवार,रोहिणी नक्षत्र रात्री बारा वाजता चंद्र उदयाच्या समयाला (श्रावण वद्य अष्टमी, शके ११९७, गुरुवार, इ.स. १२७५) शीतल शांत स्वरुपातून विश्व कल्याणार्थ श्रीकृष्ण भगवान विष्णु ज्ञानराज रुपाने जन्मले. ""विश्व तारावया आले। खेचर वंदीतो पाऊले।।'' माऊलींचे जन्मनांव विद्याधर, वृषभ राशी, शुक्र राशाधिपती, सर्प योनी, मनुष्य गण, इष्ट घटी पंचेचाळीस, जन्म तारीख १५/०८/१२७५ रोजी ""विठ्ठल रुख्मिणीच्या कुशी अवतरले ऋषिकेशी''
या प्रमाणे माऊलींची जन्म लग्न कुंडली. पुढे दोन वर्षांनी ब्रह्मदेव सोपान काका मानव रुपाने जन्मले. ""ब्रह्मा सोपान तो झाला। भक्ता आनंद वर्तला।।'' शके ११९९ ईश्वरनाम संवत्सरे कार्तिक शुध्द पोर्णिमा रविवार, एक प्रहर रात्र. पुढे दोन वर्ष अंतराने आदिशक्ती संत मुक्ताई स्वरुपातून प्रगटल्या. कारण मानव देहात आल्यानंतर संसाराला गती कन्ये शिवाय लाभत नाही. म्हणून त्रिंबकपंतांनी वर मागून घेतांना कुळात कन्या पाहिजे हे मागितले होते. ""कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयांचा हरिक वाटे देवा।।''
शके १२०१ प्रमाई नाम संवत्सर अश्विन शुध्द प्रतिपदा दोन प्रहरी मध्यान्हकाळी शुक्रवारी जन्माला आल्या. नवरात्रातील घट स्थापनेच्या दिवशी म्हणजे शक्ती अवताराच्या वेळी जन्मशक्ती अवतार रुपी घेतला. पुढे माता पिता ही चारही भावंडे आपेगांवी रहात होते. कारण आपेगांवला फक्त एकच ब्राह्मण घर होते. त्यामुळे इतर मानसिक त्रास रोज नव्हता. विठ्ठलपंतांनी आळंदी,पैठण,काशीच्या ब्रह्मवृंद्यांकडे अनेक चकरा मारल्या. मुलांचे मौंजीबंधन करायचे शुध्दीपत्र पाहिजे, पण शुध्दीपत्रापेक्षा त्रासच जास्त होत होता विठ्ठलपंत ब्रह्मज्ञानी होते. विद्वान होते. ईश्वर अवतार आपल्या उदरी जन्मण्याची जाणीव होती. त्याचे हातून विश्व कल्याण होणार होते. याचा दृढ विचार करुन एके दिवशी रुख्मिणी मातेला सर्व वृत्तांत सांगितला. मातेचाही तेवढा अधिकार होता पण शेवटी मातृहृदय होते. काही क्षणापुरता मुलांच्या पालनपोषणाचा विचार येई कारण मुक्ताई फक्त तीन वर्षाची होती आणि एके दिवशी हृदय दगडासारखे बनवणे भाग होते. कारण विश्वात काही मोजकेच संस्कृत जाणणारे ते पण अभिमानी त्यामुळे जी भगवद्गीता विश्वातील प्रत्येक मानवाला ईश्वरीय ज्ञान होणेसाठी व मानव सुखासाठी निर्माण झाली. त्याचा उपयोग काय? व ती भगवद्गीतारुपी अमृत सर्व सामान्य प्राणीमात्रांपर्यंत पोहोच होऊन त्यांना कृतीत उतरले पाहिजे व ती ईश्वरीय शक्ती आपल्या उदरात जन्म घेतला. आपण जर त्यांचे संगोपणाचा विचार करुन त्यांचे भोवती वलय राहून थांबलो तर विश्व मानवाला अज्ञानरुपी गडद अंधारात स्वत: आपण ढकलून दिल्या प्रमाणे होईल. पण मनात परत त्या लहान लहान गोंडस सुप्रकाशित बालकाकडे पाहिले की, मात्र हृदय जागे होत होते. तेही स्वभाविकच होते. कारण जन्माला आलेल्या बालकांना फक्त मायेचा हात अंगावर फिरवण्यावाचून काही करु शकलो नाही. आणि शक्यही नव्हते. त्याला सर्व जबाबदार म्हटले तर समाज व त्यातील अनिष्ट चालीरुढी मग प्रश्न? मग ज्यांनी आपल्याला लाथाडलं, दगड, शेण मारले वाळीत टाकले त्यांचेसाठी आपण का म्हणून हे सर्व करावे? नाही आपली संस्कृती आपण ईश्वरीय भक्तीत ज्या कुळात जन्म घेतला त्याचे कार्य करायचे ते जर आपल्यामुळे अर्धवट रहात असेल तर या जगण्याला अर्थ काय? किती त्यागी अंत:करण पिळवटून काढणारा विचार माता रुख्मिणी आईच्या मनातील विचार पिताजी विठ्ठलपंतांना वर्तत होती. विठ्ठलपंत एकाग्रचित्र करुन ऐकत होते. सुन्न शांत दगडासारखी मूर्ती करुन बसले होते. आणि शेवटी एक शब्दात विठ्ठलपंतांनी माता रुख्मिणीआईला सांगितले आज रात्री बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी आपल्याला आपेगावातून जावे लागेल. विचार संपला आता वाचकांच्या मनात येईल त्यांनी देहांत प्रायश्चित दिले म्हणून त्यांनी जळात उड्या घेतल्या. काहीचे म्हणणे आत्महत्या केली. थोडा विचार करा. कारण ""मनुष्य देही जाण। ज्ञान अधिक असे।।'' मानवाला इतर प्राण्यापेक्षा ज्ञान दिले आहे. याचा उपयोग जर सत्यत्वासाठी केला तर वरील अनेकांचे विचार म्हणजे थोतांड फापट पसारा आहे हे समजेल! कारण ज्यांचे उदरी चारही देव जन्माला आले. ते स्वत: विद्वान पंडीत होते. संस्कृती जपणारे होते. रामानंदासारखे सद्गुरुचे आशीर्वाद पाठीशी होते. त्यांना देहांत प्रायश्चित्त देणारे कोण? काय अधिकार पोहचत होता? जर अधिकार किंवा ग्रंथ आधार होता तर? पुढे ज्ञानराज माऊलींनी श्रीक्षेत्र पैठण येथे रेड्यामुखी वेद बोलवला ""म्हैशीपुत्रा मुखी। बोलविली श्रृती ।।'' येथे अवर्जून हे प्रमाण देत आहोत. कारण "रेड्यामुखी वेद बोलविला' या प्रमाणाने काही बुध्दीवादी ज्ञानी समजणारे गडद अज्ञानी विपर्यास लावतात की, रेड्यासारख्या बुध्दीच्या मानवाला बोलायला लावले म्हणून पुढे ज्ञानराज माऊलींनी नाथांच्या आवारात वरील प्रमाण टाकले. आता तुम्ही विचार करायचा कितीही विज्ञान प्रगती झाली तरी म्हशीला मानवरुपी पुत्र जन्माला येऊ शकेल असे शक्यच नाही. आणि मग त्यावेळेस त्याच ज्ञानी लोकांनी रेड्याच्या मुखातून निघणारे वेद आपल्या दप्तरी बरोबर का चूक तपासले याचाच अर्थ तुमचे तुम्हाला विश्वास नव्हता. मग आमच्या माता पितांना देहांत प्रायश्चित्ताचा आदेश देण्याचा काय अधिकार? तर विश्व कल्याणासाठी या दोघांनी या मायभूमीत विचार केला हा देह पंचतत्त्वाचा याला नष्ट करणेसाठी कोणत्या तरी एका तत्वाचा आधार घ्यावा लागेल म्हणून रात्री बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ""तात आणि मात गेलेशी येथूनी । तेंव्हा आम्ही लहान पांडूरंगा।।'' ना.म.मुक्ताईने वर्णन केले प्रमाणे विठ्ठलपंत बाहेर पडले. रुख्मिणी माता घरात होत्या मुक्ताईला मांडीवर घेऊन स्तनपान करुन मुखावरुन हात फिरवित होती. कंठ दाटून आला होता. हृदय पिळवटून निघत होते. आपण या लहान लहान बालकांना सोडून जात आहोत. त्यावेळेला मुक्ताई तीन वर्षाची होती. पाच वर्षाचे सोपानदेव सात वर्षांचे माऊली आणि नऊ वर्षांचे निवृत्तीनाथ. पाठीमागे काय होतं, असा हा समाज सन्याश्याची मुले म्हणून तुच्छ समजणारा, पांघरायला आकाश, अंथरायला धरती, खायला हवा एवढाच काय तो आधार, मातेचे अंत:करण छिन्न विछिन्न झाले होते. शरीराचे तुकडे तुकडे झाले होते. पण ""पती जिच्यामते। अनुसरुनी पतीव्रता। अनायासे आत्महिता। भेटे जी ते।।'' ज्ञा.अ.16 ओ.456, पतीव्रतेचे पती विषयी व्रतच असे आहे. मनविषिन्न करणारा प्रसंग होता. एका कवी मनाने त्यावेळचे वर्णन करतांना. ""चालली माता देवांची। रडते तरुवर रडती धरणी। रडते आकाश पाषाणालाही पाझर फुटतो।।'' असा हा प्रसंग घडत असतांना बाहेरुन हळूच पण कठोर शब्दात आवाज आला. थांब रुख्मिणी मी निघालो तुला मायेचा पडदा दूर करता येणार नाही. विठ्ठलपंतांचे करारी वाक्य मातेने ओळखले आणि मातेने मुक्ताईला कुरवाळले व ज्ञानराजाच्या डाव्या पायाच्या करंगळीला हात लावला. आत्म्याशी संवाद साधत असतांना मातेने आज्ञा केली, ""हे ज्ञाना या विश्वाला सांभाळ''. आणि माता विठ्ठलपंतांच्या मागे निघून गेली परत येण्यासाठी नाही. लिखाण करत असतांना क्षणभर हात थरथरले, लेखणी बंद पडली किती मोठा विचार करुन मातेने स्वत:च्या छातीवर दगड ठेवला असेल कल्पना करवत नाही.
पुढे एक वर्ष चारही भावंडे आपेगांवला राहिली, ""निवृत्ती,ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न। सांभाळी सोपानमजलागी।।'' अशा प्रकारे विश्वात्मक माऊलींच्या मातापित्यांच्या नावाने हे चिरंतन राहणारी (हेमाडपंथी) दगडाची वास्तु भव्यदिव्य प्रमाणात उभारत आहेत. मंदिराचे संकल्पना करत असतांना सद्गुरु विष्णु माऊली प्रेरणेने संकल्प केला माझ्या माऊलीच्या मंदिरासारखे जगतात कोठेही त्या सारखे असता कामा नये. माऊलीचे दर्शन घेऊन सद्गुरु माऊलीचे दर्शन आशीर्वाद घेतला. गुरुमाऊलींनी आशीर्वाद दिला,""तुम्ही जे जे कराल। ते ते विठ्ठला साजिरे।।'' या महान आशीर्वादातून व आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ज्ञानराज माऊली जन्मोत्सव सोहळ्याच्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी रोजी मंदिराचे भूमीपूजन केले.

या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी तप व अनुष्ठान केल्यामुळे या भूमीस ज्ञानेश्वरांचे शक्तिपीठ म्हणून संबोधले जाते. हे स्थान भौगोलिकदृष्ट्याही वैशिष्ट्यपूर्ण आहे. गोदावरी तीरावर वसलेले श्री क्षेत्र आपेगाव हे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व अहमदनगर या चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.
गावामध्ये शिरताच पहिल्यांदा एक मोठे प्रवेशद्वार दिसते. ‘दानशूर श्रीमान रसिकलाल माणिकचंद धारीवाल प्रवेशद्वार’ असे त्याचे नाव आहे. प्राचीन कमानदार वेशीसारख्या या प्रवेशद्वाराच्या खांबांवर सिंहमुख तसेच यक्षमूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. याशिवाय प्रवेशद्वारावर एका मावळ्याची उभी प्रतिमा आहे. त्याच्या बाजूला तोफांच्या दोन प्रतिकृती आहेत. या वेशीतून गावात गेल्यानंतर एका टोकास बाहेरून एका जुन्या प्राचीन वाड्यासारखी भासणारी वास्तू दिसते. पिवळ्या रंगात रंगवलेल्या या वास्तूचे प्रवेशद्वार गावाबाहेरील वेशीप्रमाणेच उंच आणि कमानदार असून त्यावर दोन्ही बाजूंस भालदार–चोपदारांच्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. या प्रवेशद्वारातून आत शिरताच समोर दगडी बांधकाम असलेले ज्ञानेश्वर मंदिर दिसते.
मंदिराचे बांधकाम हेमाडपंती शैलीप्रमाणे दगड, चुना व शिसे यांचा वापर करून करण्यात आलेले आहे. दगडी उंच जोत्यावर मंदिर बांधलेले आहे
.
सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात जाण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. सभामंडप हा खुल्या प्रकाराचा असून त्यात दहा खांब आहेत. त्यांवर पुष्पाकृती कोरून त्यांची सजावट करण्यात आलेली आहे. हे सर्व खांब दगडी महिरपीने एकमेकांस जोडलेले आहेत. सभामंडपावर छोटे शिखर असून त्यावर कळस आहे. तेथे वरपासून खाली टांगलेली एक घंटा आहे. मध्यभागी छोट्या दगडी ओट्यावर पादुका आहेत. तेथूनच गर्भगृहातील संत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीचे मुखदर्शन होते. गर्भगृहाच्या चौकटीस चांदीचा पत्रा मढवलेला असून त्यावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. द्वारपट्टिकेवर गणेशाची मूर्ती व दोन्ही बाजूंस शुंड उभारलेली गजमुखे आहेत. आत समोरच एका उंच दगडी आसनावर बसलेली संत ज्ञानदेवांची अर्धपारदर्शक हस्तिदंत रंगाची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीचा एक हात शांतमुद्रेत असून एका हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे. आसनावरही कलाकुसर केलेला चांदीचा पत्रा मढवलेला आहे.

या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम इ.स. २०१९ मध्ये पूर्ण झाले. मंदिराच्या प्रांगणात कीर्तन सभागृह आहे. त्यात संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांच्या जीवनातील विविध प्रसंगांची भीत्तिचित्रे चितारण्यात आलेली आहेत. येथेच या भावंडांच्या वंशावळीची माहिती देणारा वंशवृक्षही दाखवण्यात आला आहे. मंदिराचे शिखर ५१ फूट उंचीचे असून त्यावर सोन्याचा कळस आहे. मंदिराच्या बाजूला संत त्र्यंबकपंत संजीवन समाधी मंदिर आहे. असे सांगितले जाते की त्र्यंबकपंतांना गोरक्षनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. ज्ञानेश्वरांच्या कुटुंबातील पहिली संजीवन समाधी त्र्यंबकपंतांनी घेतली.

मंदिर आवारात अजानवृक्ष आणि पिंपळ आहे. अशी आख्यायिका आहे की गृहस्थाश्रमाचा त्याग करून निघून गेलेले विठ्ठलपंत परत यावेत म्हणून त्यांच्या पत्नीने या पिंपळास सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या.
मंदिराचे वैशिष्ट्ये
* संपूर्ण मंदिर व मंदिराचे परिसरातील सांस्कृतिक हॉल हे सर्व हेमाडपंथी दगडाचे बांधावयाचे.
* मंदिराचा कळस चौतीस किलो सुवर्णाचा करावयाचा.
* गोदावरी गंगेवर 200 मिटर लांबीचा सुंदर घाट तोही हेमाडपंथी बांधावयाचा, मंदिरात येणेसाठी घाटावरुन वरती 108 पायऱ्या त्या सरळ ज्ञानराज माऊलीचे प्रपितामह (पणजोबा) भक्त त्रिंबकपंताचे दर्शन प्रथम तपस्वी त्रिंबकपंतांचे दर्शन तपानेच झाले पाहिजे. सहज माऊली जप करत 108 पायऱ्या चढल्या नंतर त्याचे वैभव ""तपाचे वैभव। तपिनिला अमुप।।'' तपानेच दर्शन पुढे सभामंडप (घंटा मंदिर) त्याला सहा पायऱ्या कि ज्या चढल्या नंतर मानव शरीरातील षड्विकार निवृत्ती होऊन घंटा मंदिरात प्रवेश 22 - 22 चा भव्य सभा मंडपात शांत चित्ताने प्रवेशाने गर्भ गाभारा अर्थात चारही भावंडांचे मंदिर त्याला चार पायऱ्या अर्थात चारी मुक्त्या ज्यासाठी ऋषि मुनी गिरी कपारीत तपश्चर्या करतात त्या सहज जीवाला मिळावयासाठी माऊलींनी हरिपाठात वर्णन केले प्रमाणे,"" देवाचिया द्वारी। उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी । साधियेल्या।।'' अशा त्या सलोकता, समीपता, स्वरुपता, सायुजता चारी मुक्त्या म्हणजे निवृत्ती,ज्ञानेश्वर,सोपान,मुक्ताई,
""स्मरिता निवृत्ती पावलो विश्रांती। संसाराची शांती झाली माझ्या।।1।।
नमिता ज्ञानदेवपावलो विसावा। अंतरीचा हेवा विसरलो।।2।।
सुखाचा निधान तो माझा सोपान। विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई।।3।।
या संत वचना प्रमाणे या मायभूमीत आल्या शिवाय जीवाला विश्रांती नाही. यावेच लागे आपेगांवी. त्या मुर्त्या बनविण्यासठी इजिप्त देशातून मार्बल दगड मागविण्यात येणार आहे. याचे कारणही तसेच त्या दगडावर एक जरी सूर्य किरण पडले तरी संपूर्ण मूर्ती तेजोमय होते. त्या दगडाची अंदाजे किंमत 50 हजार रुपये म्हणजे दोन लाख रुपये फक्त दगडाचे तेथून आणणे व मूर्त स्वरुपात साकारण्याचा वेगळा खर्च. यात सर्वात महान वैशिष्ट्य म्हणजे ज्या दिवशी ज्ञानराज माऊलींनी संजीवन समाधी घेतली तो दिवस कार्तिक वद्य त्रयोदशी 12 वा. 53 मिनिटांनी त्यावेळेस माऊलींच्या अंगावर सूर्यकिरण पडावे या दृष्टीने मंदिराच्या कळसाची रचना वास्तुतज्ञ श्रीयुत माऊली भक्तीनिष्ठ महेश साळुंके हे सर्व कार्य एकनिष्ठतेने करीत आहेत. आज माऊली मंदिर परिसरातील पहिल्या टप्प्याचे अजानवृक्ष सुवर्ण पिंपळ,""जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ। अंगी ऐसे बळ। रेडा बोले।।'' ""अजान वृक्षाची पाने जाण। जो भक्षूनी करील अनुष्ठान। त्यासी साध्य होईल ज्ञान। येथे संशय नाही।।'' या संत प्रमाणाप्रमाणे अंदाजे किंमत 2 लाख 65 हजार रुपये खर्चून पूर्णत्वास आले आहे व दिनांक 14 फेब्रुवारी 2008 रोजी मान्यवरांचे हस्ते भक्त त्रिंबकपंतांचे मंदिर पाया खोदणे समारंभ मोठ्या थाटामाटात होत आहे.
आवारात एक गुरुकुल बांधण्यात आले असून तेथे पाचव्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तसेच त्यांना कीर्तन–प्रवचनाचे धडे, गीता, हरिपाठ व विचारसागर हे शिकवले जाते. ही मुले गावातील जिल्हा परिषदेच्या, तसेच खासगी शाळेत शालेय शिक्षणही घेतात. याच आवारात अलीकडे गुरुवर्य विष्णुमहाराज कोल्हापूरकर यांच्या समाधीचे दुमजली दगडी मंदिर बांधण्यात आले आहे. खालच्या मजल्यावर त्यांचे समाधिस्थान आहे. बाहेरून लोखंडी शिडीने मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर जाता येते. तेथे महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. विष्णुमहाराज कोल्हापूरकर व ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी आपेगाव हीच ज्ञानेश्वर व अन्य भावंडांचे जन्मगाव आहे हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयापर्यंत जाऊन प्रयत्न केले होते.
या मंदिरात सातत्याने धार्मिक कार्यक्रम होत असतात. ज्ञानेश्वरांचा जन्म गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर झालेला असल्याने त्या दिवशी येथे मोठा उत्सव केला जातो. पारायण, हरिपाठ आदी कार्यक्रम येथे वर्षभर सुरू असतात. २९ ऑगस्ट १९७५ रोजी शासनाच्या वतीने येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म सप्तशताब्दी सोहळा साजरा करण्यात आला होता. याशिवाय आपेगावच्या विकासासाठी राज्य शासनाने २०११ मध्ये पैठण–आपेगाव विकास प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे.
उपयुक्त माहिती:
- पैठणपासून आठ किमी, संभाजीनगरपासून ६३ किमी
- पैठण, शहागड येथून एसटीची सुविधा तसेच खासगी वाहतूक सेवा उपलब्ध
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासासाठी धर्मशाळा व हॉटेलची सुविधा
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२८ ३६६१६, ८२०८३३८९९३
- ईमेल : dnyaneshwarmaharaj@gmail.com
आपला भक्तिविनित
श्री.ह.भ.प.अंतरंग शिष्यशिरोमणी
ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर (दादा)
माऊली जन्मक्षेत्र आपेगांव,ता.पैठण,जि.औरंगाबाद.
मो.9822836616
मुंगी पैठण :-
भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून नद्यांना खूप महत्त्व आहे. नद्यांच्या किनारी अनेक संस्कृत्या उदयाला आल्या आणि लोपही पावल्या त्याच बरोबर अनेक गावे नद्यांच्या किनारी वसलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने गोदावरी नदी काठी गोदा संस्कृतीचा उदय झाला. गोदावरी नदी काठी अनेक गावे वसली. या गावांना प्राचीन काळापासून प्रचंड धार्मिक, ऐतिहासिक,सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील अनेक गावांचा इतिहास हा वैशिष्टय़पूर्ण आहे. त्या असाच वैशिष्टय़पूर्ण ऐतिहासिक वारसा व धार्मिक महत्व असणारे मुंगी हे गाव आहे. हजारो वर्षाचा ऐतिहासिक वारसा असणारे गाव मुंगी पैठण हे पैठण या ऐतिहासिक शहरापासून फक्त १२ किलोमीटर अंतरावर आहे. मुंगी या गावाचा फार प्राचीन इतिहास आहे. पूर्वीच्या काळी या गावाला पैठण या शहरासारखेच महत्त्व होते. प्राचीन काळी या गावाला पीपिलिका असे म्हणायचे. कारण या ठिकाणी दधीची ऋषी यांचा मुलगा पिप्यलाद याने येथे पीपीलिकेश्वर महादेवाची स्थापना केली होती. त्यानंतर या गावाला पीपीलिकेश्वर नाव पडले. यासंबंधीचा उल्लेख काशीखंड कथासार या ग्रंथांमध्ये केलेला आढळून येतो. पैठण या शहरापासून हे गाव जवळच असल्यामुळे या गावाचा उल्लेख मुंगी पैठण असा केला जातो. तसेच अनेक ग्रंथांमध्ये या परिसराला प्राचीन काळी वैदूर्य पतन असं म्हटलं जात होतं असा उल्लेख आहे अनेक वर्षापासुनच मुंगी गावाचे नाव मुंगी -पैठण,मुंगी- शेवगाव या नगरांशी जोडलेले आहे अनेक संत,महापुरुष,विद्वान यांचे जन्मगाव हे मुंगी आहे.

मुंगादेवी मंदिर
मुंगादेवी
श्री भगवान निम्बरकाचार्य मंदिर
गोदावरी नदी पात्र
येथे १८६३ मध्ये संशोधकांना अश्मयुगीन मानवाने बनवलेले अनेक दगडी हत्यारे सापडली. त्याचबरोबर जवळच असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रातही काही प्राचीन अवशेषही सापडले. त्यावरून हे गाव अश्मयुगातदेखील मानवी वस्तीचे केंद्र होते असे मानले जाते. आणि तसे अनेक पुरावे संशोधकांना मिळालेले आहेत. महाराष्ट्राच्या अश्मयुगीन लेखनाला सुरुवात याच गावात सापडलेल्या पुराव्यांनी झालेली आहे असे म्हणतात. निंबार्क समाजाचे प्रवर्तक श्री निंम्बार्क महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झालेला असून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे सख्खे बंधू विठोजीराजे भोसले यांच्याकडे काही काळ मुंगी गावाची जहागिरी होती.
ऐतिहासिक नोंदी अभावी विस्कटू लागलेले इतिहासाचे धागे कधी कधी अज्ञात पैलूंचा उलगडा करून देतात. असे पैलू न कधी ऐकलेले असतात न कधी पाहिलेले. पण त्यांच्या अज्ञातपणातही एक मोठा इतिहास दडलेला असतो. गावागावात जमीनदोस्त होत असलेल्या ऐतिहासिक वास्तू हा इतिहास कुरवाळून उभ्या असतात. यादवकाळाशी ऋणानुबंध सांगत छत्रपतींच्या घराण्यांची वंशावळ उलगडणारे सिन्नरमधील वावी हे गाव वरद परशरामाच्या समृद्ध लोककलेचीही ओळख करून देते. मन प्रसन्न करणारा हा प्रवास आपल्याला इतिहासाच्या पानांपलीकडे घेऊन जातो.
वावीतील राजे भोसले घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याशी असलेला संबंध वावीची ऐतिहासिक गूढता वाढवीतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे दक्षिणेत येण्यापासून ते पणजोबा बाबाजी भोसले यांच्यापर्यंतचा प्रवास वावी उलगडताना दिसते. अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर स्वारी केली. यानंतर घडलेल्या अनेक घडामोडीनंतर सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलिपसिंह बहामनी राज्याची स्थापना करणाऱ्या हसन बहामनीकडे आले. याच दिलिपसिंहापासूनची १३ वी पिढी म्हणजे बाबाजी भोसले, असे संदर्भ मराठी रियासत, शिवछत्रपती समज-अपसमज व क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज या पुस्तकात मिळते व वावीतील राजे भोसले घराण्यातील वंशजही त्यास दुजोरा देतात. बाबाजी भोसलेंकडे आठ गावाची पाटीलकी होती. त्यांना मालोजी राजे व विठोजी राजे अशी दोन मुले होती. दोघेही निजामशाहीत वेरूळ-घृष्णेश्वर भागात पराक्रमी व उत्तम प्रशासक होते. पुढे मालोजींना पुणे व सुपे जहागिरी मिळाली तर विठोजी भोसलेंना मुंगी, पैठण, हिरडी, बेरडी, जिंती, वेरूळ, वांबोरी व वावी ही गावे मिळाली. विठोजींनी आपल्या आठ मुलांना प्रत्येक गाव दिले. यात नागोजी यांना वावी हे गाव मिळाले अन् वावी राजे भोसलेंची म्हणून ओळखली जाऊ लागली.
मालोजी राजेंना शहाजी आणि शरीफजी अशी दोन मुले झाली. तर विठोजी राजें व पत्नी रेखाऊ यांना एकूण ८ मुले झाली. संभाजी, खेळोजी, मालबा (मालोजी), मंबाजी, नागोजी, परसोजी, त्रिंबकजी आणि काकजी (मकाजी). शके १५४४ च्या फाल्गुन महिन्यात खंडागळेच्या हत्ती प्रकरणात लखोजी जाधवराव आणि शहाजी राजे भोसले यांच्यात मोठा संघर्ष घडून त्यात जाधवरावांकडून संभाजी राजे भोसले मारले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे याचं इंदापूरच्या युद्धात अकाली निधन झालं. त्यानंतर शहाजीराजेंची म्हणजे शिवरायांच्या वडिलांची संपूर्ण जबाबदारी मालोजीराजेंचे बधू विठोजीराजे यांनी घेतली होती. त्यांनी शहाजीराजेंना घडवलं. भोसले घराण्यात सुरुवातीच्या काळात आपापसात किती प्रेम होते पहा. मालोजी राजेंचे निधन झाले म्हणून त्यांचे बंधु विठोजीराजेनी आपल्या एका मुलाचे नाव मालोजी ठेवले. तर आता विठोजी राजेंचा मुलगा संभाजी ठार झाले तेव्हा शहाजी राजेंनी आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले. पुढे कारकीर्द वाढत गेली तसे शहाजीराजे आदिलशाहीच्या दरबारी कर्नाटकात गेले.
विठोजी राजेंचे बहुतेक वारस हे मोगल किंवा आदिलशाहकडे चाकरीस राहिले. ईकडे विठोजीच्या मुलांची परिस्थितीही सधन असल्याचे त्यांच्यातील वाटणी पत्रावरून दिसून येते. त्यात १०८ तोळे सोने आणि २१०० होनाचा उल्लेख आलेला आहे. प्रत्येकाला विविध गावची जहागीरही मिळाली होती. पैकी मुंगीची जहागीरही नागोजीरावांना मिळाली. तेथे ते आपली पत्नी राणूबाईसह मुक्कामाला असून हजारो एकर जमीन आणि गोदावरी काठावर भव्य स्वरुपातील गढी बांधून मुंगी गावाला त्यांनी वैभव प्राप्त करून दिले होते. नागोजीराजे आणि राणूबाईना मुलबाळ झाले नाही. तेव्हा त्यांनी वळसे ( ता. अकोले जि. नगर ) येथील आपल्याच घराण्यातील एक वारस मालोजीला दत्तक घेऊन मुंगीला आणले. पुढे नागोजी राजेंचेही निधन झाले आणि राणूबाईही खूप थकल्यातरी नामस्मरण करत गोदावरीकाठी शांततेचे जीवन जगत होत्या.
ईकडे शहाजी राजे कर्नाटकात राहिले असलेतरी त्यांचे पुत्र छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा डाव मांडून तो पुढे नेत असता १० ऑक्टोबर १६५९ ला आदिलशाही सरदार अफजलखानाने त्यांच्यावर जीवघेणी स्वारी केली. या स्वारीचे वेगळे दुर्भाग्य म्हणजे विठोजी राजेंचे एक पुत्र मंबाजी भोसले हे खांनाकडून लढत होते. या स्वारीत शिवरायांना विजय प्राप्ती झाला. त्यात अफजलखानासह मंबाजी भोसले मारले गेले. राजेंच्या आयुष्यात असले अनेक प्रसंग आले तरी ते नेटाने पुढे चालत राहिले. त्यानंतर पन्हाळ्याचा वेढा, शाहीस्तेखान प्रकरण आटोपल्यावर औरंगजेबाचा सेनापति मिर्झाराजे जयसिंहाने पुरंदरचा तह करण्यास भाग पाडले. त्यातूनच छत्रपती शिवरायांना आग्र्याला जाणे भाग पडले. त्यानुसार फाल्गुन शुद्ध नवमी वार सोमवार दिनांक ५ मार्च १६६६ ला शिवरायांनी राजगडावरून आग्र्याच्यादिशेने प्रस्थान केले. रस्त्यात जात असताना राजे पैठणला गेले. तेव्हा मुंगीस आपल्या काकी राणूबाईसाहेब मुक्कामाला असल्याचे समजताच राजे तसेच तडक सडेस्वारनिशी मुंगीस काकीसाहेबांच्या दर्शनास गेले. महाराजांनी काकीसाहेबांना आदरपूर्वक विनंती केली की, “ जिंतीस ( ता. करमाळा, जि. सोलापूर ) चलावे.” काकींना गंगातिरीच (गोदावरी काठी ) राहण्याची ईच्छ्या होती. तेव्हा महाराज उतरले की, “ आपले आशिर्वादेकरून संस्थान हातास आलियास कसबे मजकूराचे चौथाईची सनद करून पाठवितो.” याच मुक्कामात राजेंनी आंबेजोगाईच्या दासोपंताना एक आभार पत्र लिहिलेले आहे.

राजे भोसले यांचा राजवाडा
पुढे राणूबाईच्या वारसाची चार मुख्य घरे शिल्लक राहिली. सुभाणजी, उमाजी, महादजी आणि संभाजी. अशी त्यांच्या वारशांची नावं. त्यांचे पुढे १६ घरं आणि शेकडो वंशज झाले. त्यामुळे जमीन विभागली केली. आज मुंगीतील भव्य गढी भुईसपाट झाली आहे. पण त्यांचे वंशज प्रभाकर राजे भोसले आजही तिथे राहतात. काही वारसदार तर अल्पभूधारक शेतकरी म्हणून जीवन जगत आहेत. कधीकाळी बारा बलुतेदारांना वाटली तेवढी जमीन आता दात्यांच्या वारसाकडे नाही. सध्या येथील गढी भुईसपाट झाली आहे त्यांच्या वारसांकडे दाखवायला एक रंगीत वंशावळ तेवढी शिल्लक आहे, बाकी काही अवशेष शिल्लक राहिलेले नाहीत.
राजे भोसले यांची वंशावळ
तसेच पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निजाम यांच्यात पालखेड येथे लढाई झाली होती. या लढाईत पराभूत झालेल्या निजामाने या गावातच तह स्वीकारला होता. तो तह मुंगी – शेवगाव तह म्हणून ओळखला जातो. तसेच मुंगी या गावात विणकर लोकांची फार मोठी वस्ती होती. हे विनकर लोक पैठणी साडी विणण्याचे काम करायचे. तसेच पैठणीला लागणारा कच्चा माल मुंगी गावातूनच पुरवला जायचा. अशा या ऐतिहासिक गावाला भेट देण्यासाठी सुद्धा पैठणला आलेले भाविक जातात.
या गावची ग्रामदेवता ही मुंगादेवी आहे दरवर्षी या मुंगादेवीची यात्रा भरत असते. यात्रेला कोकणा मधून ही भाविक भक्त येत असतात.
ह. धी. सांकलिया स्मृतिगृहातील (डेक्कन कॉलेज) नेवासाच्या स्तर क्रमाचे
त्रिमिती मॉडेल पुरापाषाणापासून ते प्रारंभिक ऐतिहासिक आणि इंडो-रोमन
व्यापार काळापर्यंतचे पुरावे, तसेच स्थानिक ग्राम संस्कृती, सातवाहन कालीन
नगर जीवन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांचा संगम या कालानुक्रमे नोंदी
नेवासा या एकाच ठिकाणी सापडतात.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या दोन्ही काठांवर वसलेले नेवासा हे
महाराष्ट्राच्या प्रागैतिहासिक ते प्रारंभिक ऐतिहासिक आणि इंडो-रोमन
व्यापार काळापर्यंतचा बहुपर्यायी सांस्कृतिक विकास दाखवणारे एक महत्त्वाचे
पुरातत्त्वीय स्थळ आहे. प्रवरा-गोदावरी खोऱ्यातील इतर स्थळांप्रमाणे
(जोरवे, दैमाबाद, इनामगाव) नेवासा येथेही मानवी वास्तव्याचा प्रदीर्घ आणि
स्तरित क्रम दिसून येतो. त्यामुळे हे स्थळ पश्चिम दख्खनच्या सांस्कृतिक
इतिहासाच्या अभ्यासासाठी ‘टाईप-साईट’ स्वरूपात मानले जाते.
नेवासा हे प्रवरा नदीच्या उत्तर तीरावरील नेवासा बुद्रुक आणि दक्षिण
तीरावरील नेवासा खुर्द अशा दोन वस्ती गटांत विभागलेले आहे. मध्ययुगीन संत
परंपरेत संत ज्ञानेश्वरांनी येथे ‘भावार्थ दीपिका’ (ज्ञानेश्वरी)
लिहिल्याचा उल्लेख असून ‘लीळाचरित्र’ व इतर भक्ती साहित्यात या स्थानाची
‘निधिवास’, ‘निधवास’, ‘नेवास’ अशी रूपे आढळतात. स्कंद पुराणातील
आख्यायिकेनुसार कुबेराने तारकासुराच्या भीतीने आपला निधी येथे लपवला आणि
त्यामुळे या क्षेत्राला ‘निधिवास’ हे नाव प्राप्त झाले. ही पुराणपर परंपरा
नेवासाच्या प्राचीन गौरवाची धार्मिक बाजू अधोरेखित करते.
प्रवरा-गोदावरी खोऱ्यातील ताम्रपाषाणकालीन संस्कृतींच्या
शोधमोहिमेदरम्यान भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पश्चिम वर्तुळातील
अधिकाऱ्यांनी, विशेषत एम. एन. देशपांडे यांनी नेवासाची प्राचीन वस्ती
म्हणून नोंद केली. जोरवे व नाशिक परिसरातील ताम्रपाषाणकालीन वस्तींचा शोध
लागल्यानंतर या खोऱ्यातील पद्धतशीर अन्वेषणादरम्यान नेवासा, दायमाबाद,
सावळदा आदी अनेक स्थळे प्रकाशात आली आणि प्रवरा खोऱ्याची स्वतंत्र
सांस्कृतिक परंपरा स्पष्ट झाली.
इ.स. 1954-56 आणि 1959-61 या दोन टप्प्यांत डेक्कन कॉलेज, पुणेतर्फे
प्रा. ह. धी. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली ‘लाडमोड टेकडी’ येथे व्यापक
उत्खनन करण्यात आले. या उत्खननांचा मूळ हेतू संत ज्ञानेश्वरांच्या काळातील
वास्तवाचे पुरातत्त्वीय चित्र उभे करणे हा होता; परंतु प्रत्यक्षात येथे
मानवी वास्तव्याचा पुरावा पुरापाषाण काळापासून मुस्लिम-मराठा काळापर्यंत
सलग अथवा पुनरावृत्तीने मिळाला. नेवासाचा स्तर क्रम हा भारतीय
प्रागैतिहासिक अभ्यासातील आदर्श मानला जात असल्याचे उल्लेख डेक्कन
कॉलेजच्या पुरातत्त्व संग्रहालयाच्या नोंदीत आढळतात. येथे पुरापाषाण (Lower
Palaeolithic) काळातील अशुलियन परंपरेतील हातकुऱहाडी, क्लीव्हर, क्रापर्स,
मध्यपाषाण काळातील लेव्हलोय तंत्रावर आधारित बनवलेली फ्लेक, तर उत्तरपाषाण
काळातील सूक्ष्माश्म (microlithic) जसे ब्लेड व सूक्ष्म दगडी साधने
सापडलेली आहेत. नेवासाला अशी क्रमाने संस्कृतींची मालिका नोंदली गेली असून
या सातत्यामुळे पर्यावरणीय बदलांनुसार मानवी तंत्रज्ञान व निवास पद्धती कशा
विकसित झाल्या याचा मागोवा घेणे सुलभ झाले आहे.
प्रवरा-गोदावरी खोऱ्यातील सावळदा, दायमाबाद, जोरवे इत्यादी
स्थळांप्रमाणेच नेवासा येथेही ताम्रपाषाण संस्कृतीचे पुरावे दिसतात. काळी
कापसाळू जमीन, नदीकाठचा उंच तट, पाण्याचा सहज पुरवठा आणि दगडमातीची
उपलब्धता यामुळे येथे स्थिर ग्रामीण वस्ती विकसित झाली असावी. जाड तळ आणि
बाह्य पृष्ठभागावर लाल लेप असलेली भांडी, हाताने घडवलेली धान्याच्या
साठय़ाचे माठ, साधे दगडी-तांब्याचे साधन संच या सर्वसाधारण ताम्रपाषाण
काळाच्या वैशिष्टय़ांचा उल्लेख उत्खनन अहवालात सापडतो. प्रवरा खोऱ्यात
दायमाबाद हे प्रादेशिक केंद्र, तर नेवासा-जोरवे ही उपकेंद्रे म्हणून मांडणी
केली जाते.
नेवासातील सर्वाधिक अभ्यासले गेलेले स्तर हे इ.स.पू. सु. 150 ते इ.स.
200 या काळात मोडणारे प्रारंभिक ऐतिहासिक स्तर आहेत, जे प्रामुख्याने
सातवाहनांच्या सत्ताकाळाशी सुसंगत ठरतात. या कालखंडातील वस्ती सु. 4600
चौ.मी.पेक्षा अधिक क्षेत्रावर पसरलेली होती आणि बहुखोली, पक्क्या विटांच्या
घरांची मांडणी सुस्थित निचरा व्यवस्था, रस्ते आणि कार्यशाळांशी नाते राखून
करण्यात आली होती. येथे मृद्भांडांमध्ये रसेट-कोटेड वेअर (लाल शिरस्ता,
बाहेर पिवळसर फुलांच्या नक्षी), नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर, काळी-तांबडी
मृद्भांडी, जाड काठ असलेली रेड वेअर अशा विविध प्रकारांचा समावेश असून हे
सर्व भारतातील प्रारंभिक नगर संस्कृतीशी निगडित असल्याचे मानले जाते.
मातीच्या खेळण्यांमधील प्राणी-मानव प्रतिकृती, स्त्राr-मूर्ती, तसेच मातीचा
छोटा चैत्य हा बौद्ध धार्मिक प्रभावाचा थेट पुरावा आहे आणि पैठण, तेर,
नाशिक येथील सातवाहन स्तराशी तुलना करता येते. सातवाहनकालीन या स्तरात
जळलेले गहू, हरभरा, बाजरी, रागी इ. धान्यांचे नमुने तसेच मांसाहाराचे
पुरावे सापडले असून मिश्र आहार पद्धती व विविध पीक पद्धतींचा वापर दिसून
येतो.
नेवासातून आहत नाणी, साच्यात ओतून बनवलेली लेख नसलेली नाणी तसेच सातवाहन
राजघराण्यातील श्री सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी
यांची नाणी प्राप्त झाली आहेत. या नाण्यांच्या आधारे वस्तीची काळपुष्टी तर
होतेच, परंतु सातवाहन यांचे आर्थिक धोरण, धातूंचा वापर आणि प्रादेशिक
व्यापार जाळ्यांविषयीही कल्पना येते.
नेवासाचे वैशिष्टय़ म्हणजे येथील समृद्ध इंडो-रोमन स्तर, जे इ.स. सु. 50
ते 200 या कालखंडात मोडतात आणि सातवाहन-रोमन सागरी व्यापाराच्या अभ्यासात
नेवासाला अग्र स्थान देतात. लाडमोड टेकडीवरील स्तरातून 63 हून अधिक
अॅम्फोरा तुकडे मिळाले असून हे प्रामुख्याने इटालियन द्राक्षारस (wine)
वाहतुकीशी संबंधित असल्याचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. महत्त्वाची बाब
म्हणजे हे अॅम्फोरा सलग आठ स्तरांत नोंदले गेले आहेत, ज्यामुळे नेवासा व
भूमध्य-मध्यपूर्व व्यापार जाळे यांच्यातील संपर्क दीर्घकाळ टिकून होता हे
स्पष्ट होते.
या स्तरातून रोमन काचेचे मणी, लहान पुतळे, विविध प्रकारची मृद्भांडी
यांचा उल्लेख नेवासा अहवालात आणि पुढील संशोधनांत सापडतो. येथे सापडलेल्या
अॅम्फोराचा झालेला अभ्यास रोमन व्यापार संस्कृती आणि जहाज वाहतूक
अभ्यासासाठी महत्त्वाचा मानला जातो. येथे सापडलेले रोमन बुलाय (bullae)
प्रकारचे गळ्यातील अलंकार, रोमन सम्राट ऑगस्टसच्या नाण्यांवरील प्रतिमांशी
तुलनात्मक असलेले प्रतिरूप, काचेच्या रंगीत बांगडय़ा, शंख आणि हस्तिदंत
अलंकार, मातृदेवतांच्या मातीच्या मूर्ती या सर्व वस्तू इंडो-रोमन
संपर्कासोबत स्थानिक सामाजिक-धार्मिक प्रतिमांचाही सहज संगम दर्शवतात. ह.
धी. सांकलिया यांचे नेवासा उत्खनन हे डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व संशोधन
इतिहासातील एक मैलाचा दगड मानले जाते आणि त्यांच्या स्मृतिगृहात नेवासाच्या
स्तर क्रमाचे त्रिमिती मॉडेल विशेषत प्रदर्शित करण्यात आले आहे.
एकाच स्थळावर पुरापाषाणापासून ते प्रारंभिक ऐतिहासिक आणि इंडो-रोमन
व्यापार काळापर्यंतचे पुरावे नोंदले जाणे तसेच स्थानिक ग्राम संस्कृती,
सातवाहन कालीन नगर जीवन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्या संगमाचा अभ्यास
करणे ही नेवासाला लाभलेली अद्वितीय देणगी आहे. प्रागैतिहासिक साधन संच,
सातवाहन नाणे व धातू साधने, रोमन अॅम्फोरा व बुले तसेच साहित्यिक-पुराणपर
उल्लेख या सर्वांमुळे नेवासा हे महाराष्ट्राच्या पुरातत्त्व शास्त्रीय
अभ्यासात एक जिवंत ‘प्रयोगशाळा’ म्हणून ओळखले जाते.
मल्लिकार्जुन मंदिर, घोटण, शेवगाव
अहमदनगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष येथे सापडतात.. पुढे १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणा-खुणा पैठण व परिसरात विखुरलेले बघायला मिळतात. शेवगाव पासून १० कि.मी. अंतरावर, नगर - पैठण मार्गावरील घोटण येथील मल्लिकार्जुन मंदिर अशाच यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडवते.
घोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट महाभारतात जाते. कौरव आणि जरासंधानी विराट राजाच्या गायी पळवल्या. त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना या ठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला ‘गो-ठाण’ असे नाव मिळाले. पुढे त्याचे अपभ्रंश होऊन घोटण असे झाले. मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली त्यामुळे इथला देव झाला ‘मल्लिकार्जुन’ अशी आख्यायिका सांगितली जाते.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. मंदिर प्रकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा नजरेस पडतात. मंदिरावरील शिखर मात्र नंतरच्या काळात बांधलेले कळते. मंदिराच्या सभामंडपात १६ खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी मढवलेले आहेत. सभागृहात दुर्मिळ अशी एक गद्धेगळ, अनेक वीरगळी, भग्न मूर्ती व मंदिराचे अवशेष आपल्या नजरेस पडतात. शिव मंदिराचा गाभारा पंधरा फूट खोल असून गाभाऱ्यातील शिवलिंग पाताळलिंग प्रकारातील आहे.
या मंदिरासमोर बळेश्वर नावाचे आणखी एक मंदिर आहे तसेच पायऱ्या चढून गेल्यानंतर काही पावलांवरच जटाशंकर महादेवाचे पुरातन मंदिर नजरेस पडते. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे असलेले स्थापत्य असणारे हे मल्लिकार्जुन मंदिर मुद्दाम वाट वाकडी करून पहावे असे आहे.
संदर्भ :-
१) https://gazetteers.maharashtra.gov.in/
२ ) http://anandgodse.blogspot.com/
३ ) https://www.facebook.com/groups/2976328375814407
४ ) https://www.facebook.com/profile.php?id=100063859161400
५ ) pandharichivari.com
६ ) https://sandeep345.wordpress.com
७ ) divyamarathi.bhaskar.com
८ ) https://pilgrimdata.in/temple/nag-ghat-paithan-city-paithan-dist-chhatrapati-sambhajinagar/
९ ) https://sampurna-mahagatha-marathasahici.quora.com/
१० ) ttps://www.bbc.com/marathi/india-43441606
११ ) discovermh.com
१२ ) divyamarathi.bhaskar.com
१३ ) जोशी, सु. ग. संपा. मराठवाडा संशोधन मंडळ वार्षिक, १९७५, पुणे, १९७५.
१४ ) http://santeknath.org/paithan.html
१५ ) https://www.misalpav.com/node/15586
१६ ) http://paithanisari.blogspot.com/2015/
१७ ) marathimati.com
१८ ) https://www.marathwadatourism.com/shri-kshetra-apegaon-is-the-birth-place-of-dnyaneshwar/
१९ ) http://apegaon.blogspot.com/
२० ) https://pilgrimdata.in/temple/sant-dnyaneshwar-maharaj-mandir-apegaon-paithan-dist-chatrapati-sambhajinagar/
२१) https://education.vikaspedia.in/viewcontent/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-91593f93294d932947/93093e91c947-92d94b93893294790291a940-93593e935940?lgn=mr
२२ ) https://bhagawatdukare.blogspot.com/2020/10/blog-post.html
२३ ) मराठी विश्वकोश https://vishwakosh.marathi.gov.in/40977/
२४ ) काशीखंड कथासार संपादक - श्री.श. रा. देवळे प्रकाशन-शारदा साहित्य पुणे
२५ ) लोकराज्य मासिक 1994 (राजर्षी शाहू महाराज राज्यारोहण शताब्दी विशेषांक)
२६ ) श्री भगवान निम्बरकाचार्य जीवन चरित्र लेखक - श्री. डॉ. प्रशांत जोशी प्रकाशक निंबार्क भूषण प्रा. श्री.सुरेश जोशी अनुराधा प्रकाशन पैठण
२७ ) जगद्गुरु भगवान श्री निम्बरकाचार्य जन्मभूमी मुंगी पैठण क्षेत्र पिपिलिका लेखक- श्री. साहेबराव गायकवाड गुरुजी प्रकाशक प्राध्यापक श्री. चंद्रकांत साहेबराव गायकवाड औरंगाबाद
२८ ) वारसा लेखक- श्री भाऊसाहेब थोरात शब्दगंध प्रकाशन अहमदनगर

>> प्रा. आशुतोष पाटील
Apatil1@mgmu.ac.in
दक्षिण गंगा समजल्या जाणाऱया ‘गोदावरी’ काठचा
‘पैठण’ किंवा ‘प्रतिष्ठान’ हा प्रदेश, जिथे अश्मयुगीन मानवाने वस्ती
केल्याचे पुरावे आजही दिसतात. या पुरातत्त्वीय संदर्भांसह नंतरच्या काळात
ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा अनेक अंगांनी
संपन्न राहिलेल्या या प्रदेशाचे स्थलमहात्म्य या सदराच्या दोन भागांमधून
आपण जाणून घेणार आहोत.
इतिहासात काही स्थळे प्रत्येक युगात आपले अस्तित्व
सातत्याने प्रस्थापित करत आलेली असतात. मराठवाडा प्रदेशात अशा अनेक
ऐतिहासिक स्थळांची उपस्थिती आढळते. या सातत्यपूर्ण अस्तित्वामागे एक
महत्त्वाचे कारण म्हणजे दक्षिण गंगा समजली जाणारी ‘गोदावरी’ नदी. या पवित्र
नदीने केवळ अनेक संस्कृतींना जन्म दिला नाही, तर त्यांची भरभराट, स्थलांतर
आणि अखेरदेखील पाहिली. एक संस्कृती संपते तेथे दुसऱया संस्कृतीची सुरुवात
होते आणि अशा प्रकारे त्या भौगोलिक परिसराची सतत वाढ होत राहिली. या
ऐतिहासिक प्रक्रियेची सुरुवात आपण अश्मयुगापासून पाहू शकतो – तेव्हा ‘पैठण’
किंवा ‘प्रतिष्ठान’ ही ओळख अस्तित्वात नव्हती. मात्र नाशिक, नेवासा, पैठण
आणि त्याही पुढील परिसरात गोदावरीच्या काठी माणसाचे अस्तित्व असल्याचे
पुरातत्त्वीय पुरावे स्पष्टपणे दर्शवतात.
इ.स. 1883मध्ये संशोधक वेन यांना मुंगी-पैठण परिसरात गोदावरी खोऱयात
विविध अश्मयुगीन हत्यारे सापडली आणि याच घटनेने महाराष्ट्रात अश्मयुगीन
संस्कृतीच्या संशोधनाची दिशा सुरू झाली. यामध्ये विशेषत अॅगेट (agatा)
दगडापासून तयार केलेली सूक्ष्म हत्यारे आढळली, जी ‘फ्लेक टूल्स’ म्हणून
ओळखली जातात. पुढे इ.स. 1956मध्ये डॉ. एच.डी. सांकलिया यांनी या भागात
पुरातत्त्व संशोधन करत असताना अनेक प्रकारची अश्मयुगीन हत्यारे शोधून
काढली, ज्यांनी त्या काळातील मानवाच्या जीवनपद्धतीचा मागोवा घेण्यास मदत
केली. जरी पूर्वी काही प्रमाणात संशोधन झाले असले, तरी गोदावरी खोऱयातील
अश्मयुगीन संस्कृतीच्या अभ्यासासाठी अधिक व्यापक व सखोल संशोधनाची आजही
आवश्यकता आहे.
जरी या प्रदेशाची पार्श्वभूमी अश्मयुगीन कालखंडात आढळते, तरी खऱया
अर्थाने नागरी जीवनाची पायाभरणी सातवाहन काळात झाली. सातवाहनांचा कालखंड
महाराष्ट्रासाठी सांस्कृतिक व आर्थिकदृष्टय़ा सुवर्णयुग मानला जातो. या
काळात परदेशी व्यापारास मोठय़ा प्रमाणात चालना मिळाली आणि प्रतिष्ठान हे
त्या व्यापारी हालचालींचे एक प्रमुख केंद्र बनले. याच काळात या नगराला
‘प्रतिष्ठान’ हे संस्कृतमूलक नाव प्राप्त झाले, ज्याचा अर्थ ‘आदरयुक्त
निवासस्थान’ असा होतो. पुढे याचे प्राकृत रूपांतर ‘पतिठाण’, ‘पतिट्ठाण’,
‘पएठाण’ अशा विविध स्वरूपांत झाले आणि अखेर ‘पैठण’ हे आधुनिक नाव प्रचलित
झाले.
पैठणच्या इतिहासाचा अभ्यास साहित्यिक, अभिलेखीय तसेच पुरातत्त्वीय
स्रोतांवर आधारित आहे. या स्रोतांवरून असे सूचित होते की, पैठणचे अस्तित्व
इ.स.पू. 350च्या सुमारास, म्हणजेच प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडात, होते.
बौद्ध, जैन आणि ब्राह्मण ग्रंथांमधून पैठणचा उल्लेख वारंवार आढळतो, तसेच
काही पाश्चिमात्य लेखकांनीही या नगराचे वर्णन केले आहे. उदाहरणार्थ
पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी आणि टॉलेमीचे जिओग्राफी. पैठणच्या संदर्भात
अनेक मिथककथा आणि लोककथा प्रचलित असून त्यांपैकी काहींमध्ये ऐतिहासिक
घटकांचा अंतर्भावही आढळतो. अशा आख्यायिका ऐतिहासिक दृष्टिकोनातून लक्षवेधी
ठरतात.
पैठण गावात मिळालेले सातवाहन कालीन अवशेष आपल्याला या इतिहासाची
पुनर्मांडणी करण्यास मदत करतात. या पुरातत्वीय अवशेषांमध्ये प्रामुख्याने
वास्तुरचना, नाणी, खापराची भांडी, दागिने, मातीच्या मूर्ती, विविध दगडाचे
मणी यांचा समावेश होतो. या साधनांच्या आधारे प्रतिष्ठान हे प्राचीन मोठे
व्यापारी केंद्र असावे हे निश्चित होते.
या पुरातत्वीय साधनांना लिखित साधनांचीही जोड आहे. एक संदर्भ येतो तो
बौद्ध सुत्तनिपात या ग्रंथातील ‘बावरी’ नावाच्या तत्त्वज्ञाच्या कथेत,
त्यात लेखक लिहितो की, अस्सक जनपदात राहणारा बावरी ब्राह्मण होता.
बुद्धांच्या तत्त्वज्ञानाबद्दल ऐकून त्याने आपल्या 16 शिष्यांना बुद्धांशी
संवाद साधण्यासाठी पाठवले. या प्रवासात त्यांनी जे मार्ग अनुसरले त्यामध्ये
‘पतिठाण’ (पैठण) हे पहिले स्थान होते. याव्यतिरिक्त दोन ग्रीक
ग्रंथांमध्ये पैठणचा स्पष्ट उल्लेख आढळतो. पहिला आहे टॉलेमीचा geographike
uphegesis (सामान्य भूगोल) आणि दुसरा आहे periplus maris erythraei जो एका
अज्ञात ग्रीक-इजिप्शियन खलाशाने लिहिलेला समुद्रमार्गदर्शक ग्रंथ आहे. हे
दोन्ही ग्रंथ एकाच कालखंडातील आहेत. झग्ज्त्ल्sच्या 51व्या प्रकरणात तो
म्हणतो, “दक्षिण भागातील व्यापार केंद्रांमध्ये दोन अत्यंत महत्त्वाची
ठिकाणे आहेत. पैठण, जे बैरगझा (भारुकच्छ) पासून दक्षिणेकडे वीस दिवसांच्या
प्रवासावर आहे; आणि पैठणपासून पुन्हा सुमारे दहा दिवसांच्या अंतरावर
पूर्वेला ‘तगर’ (तेर) नावाचे एक दुसरे मोठे शहर आहे. या दोन्ही ठिकाणांहून,
रस्तारहित विस्तीर्ण प्रदेश ओलांडून बैरगझाकडे गाडय़ांद्वारे मोठय़ा
प्रमाणात वस्तू आणल्या जातात. पैठणहून मोठय़ा प्रमाणात ओनिक्स रत्ने, तर
तगरहून सर्वसामान्य प्रतीचे कापड, विविध प्रकारची सुती वस्त्रs, मोलोकिनॉन
(श्दत्दक्प्ग्हदह) या प्रकारचे वस्त्र तसेच किनाऱयालगत मिळणाऱया इतर वस्तू
स्थानिक बाजारात विक्रीसाठी येतात.’’ या उल्लेखावरून या परिसरात किती मोठय़ा
प्रमाणात व्यापाऱयांची रेलचेल असेल याचा आपल्याला अंदाज येतो.
प्राचीन महाराष्ट्रातील एक महत्वाचं साम्राज्य म्हणजे सातवाहन! त्यांचा
कालावधी साधारण इ.स.पू. 200 ते इ.स. 200 असा मानला जातो. अनेक
अभ्यासकांच्या मते ही सातवाहनांची राजधानी होती, काही ग्रंथांमध्येही तसा
उल्लेख येतो. पण यावर अभ्यासकांचे एकमत नाही. मागे उल्लेखलेल्या टॉलेमीच्या
भूगोल या ग्रंथात तो ‘बैथाना’ या ठिकाणाचा उल्लेख ‘एग्rद झ्दतस्aग्दे’
नावाच्या एका राजाची ‘राजधानी’ म्हणून करतो, अभ्यासकांच्या मते हा राजा इतर
कुणी नसून सातवाहन राजा ‘वासिष्ठीपुत्र श्री पुळुमावी’ आहे. यामुळे अनेक
विद्वानांनी पैठणला सातवाहनांची राजधानी मानले आहे.
जैन ग्रंथ असलेल्या कालकाचार्य कथानक नुसार, “सातवाहन राजे (सालिवाहन)
पैठणमध्ये राज्य करीत असताना जैन भिक्षू कालकाचार्य त्यांना भेटायला आले.’’
यात सातवाहन राजे पैठणहून राज्य करतात असे लेखक लिहितो. त्याचबरोबर जैन
ग्रंथ ‘बृहतकल्पभाष्य’ (श्लोक 6244-6249) मध्ये पैठणला महाराष्ट्राच्या
प्रमुख शहरांमध्ये गणतात तर कल्पसूत्रमध्ये पैठणला एक शिक्षणाचे केंद्र
म्हणून उल्लेख केला गेला आहे. या शहराची एकंदर स्थिती लक्षात घेण्यासाठी हे
उल्लेख महत्त्वाचे ठरतात. हे शहर केवळ वस्तू-वास्तूंनी संपन्न नव्हते तर
भद्रबाहू आणि वराहमिहिर यांसारख्या महान तत्त्वज्ञांना पैठणचे रहिवासी
असल्याचे गच्छाचारवृत्त (208) या ग्रंथात म्हटले आहे.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)
ज्ञानेश्वरांची 3 भावंडे आहेत. सर्वात मोठा निवृत्तीनाथ तर सोपान आणि मुक्ता की लहान आहेत. ज्ञानेश्वर चे वडील विठ्ठलपंत काही वर्षासाठी तीर्थयात्रेला गेले होते तेच ते आळंदी या ठिकाणी थांबले यादरम्यान आपेगाव येथे आपल्या कुटुंबासोबत राहत असलेले ज्ञानेश्वर यांना लोक सन्याशाची पोर म्हणून छळत असे. त्यांना गावातून बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आपेगाव आणि तसेच महाराष्ट्रातील मोठ्या अंतरापर्यंत पुरोगामी ब्राम्हणांचे वर्चस्व होते तसेच जातीभेद उंबरठयावर होते.
श्री.ह.भ.प.श्र्रो.ब्र.नि.वे.शा.सं.कैवल्यमूर्ती विष्णु महाराज कोल्हापूरकर (गुरुजी) यांनी या जन्मभूमी व मंदिर कामासाठी संपूर्ण आयुष्य अथांग परिश्रमातून केलेले कार्य अंगावर शहारे आणणारे असे आहे. ""तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे'' या संत वचनाने माऊलींची जन्मभूमी आपेगांव का आळंदी? इथ पासून ते आज माऊलीचे सुबक सुंदर असे संपूर्ण हेमाडपंथी (दगडाचे) बांधकामापर्यंत स्वत:च झगडत आहे. ज्या विश्ववंदे, विश्वमाता, विश्वकल्याणाचे अर्थ त्यांच्यामनी अखंड तेवत चंद्र,सूर्य,पृथ्वी असे पर्यंत ज्योत जपली,जपतात त्या भूमीला व माऊलींच्या माता पिता यांना वाळीत काढले असे वाटत नाही. कारण शासन दुर्लक्षित ही भूमी परंतु गुरुवर्य विष्णु माऊली त्याच जोमाने कार्य करत आहे. म्हणून आज 19 कोटी 25 लाखाचे भव्यदिव्य मंदिर उभारत आहे. ते सर्व सामान्य जनतेपासून विद्वानांपर्यंत प्रत्येक अभ्यासकांना ज्ञान,विज्ञान या मंदिरातून मिळेल ही संकल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमीचा वाद जन्मसप्तशताब्दी निमित्त उफाळून आला. बुध्दिवादी पुणेकरांनी जन्म आळंदीत झाला. जन्मसप्तशताब्दी तेथेच झाली पाहिजे असे शासन दरबारी लावून धरले. आपेगांव पक्षातर्फे श्री.ह.भ.प.श्र्रो.ब्र.नि.कैवल्यमूर्ती विष्णु महाराज कोल्हापूरकर (गुरुजी) व संत वाङमय संशोधक प्रा.कृष्णा गुरव (सर), श्री.ह.भ.प.शंकर महाराज खंदारकर, श्री.ल.रा.पांगारकर असे मोजकेच लोक होते. शेवटी कितीही तर्क वितर्क बुध्दीवाद विकृतीचा कळस म्हणजे सुपारी देऊन मारणे पर्यंत करुन पाहिले. हे सर्व वितंटवाद ठरले कारण ईश्वरी कार्य करत असतांना गुरुवर्यांच्या पाठीशी सद्गुरु ब्र.भू.ह.भ.प.थोर संत वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर (गुरुजी) यांचे आशिर्वाद व गुरुआज्ञा ""विष्णु तू ही ज्ञानेशांची जन्मभूमी सिध्द करुन मायभूमीची सेवा कर'' त्यामुळे शेवटी असत्य ते असत्यच राहीले व सत्य उघडकीस आले. नामदेव महाराजांच्या स्पष्ट प्रमाणाद्वारे
मायभूमी पाहू यांची आम्ही डोळा। चलावे गोपाळा सहजासहज।।
भक्त त्रिंबकपंत मूळपुरुषादि । तयाची समाधी आपेगांवी।।
आपेगांवी आले देव ऋषिश्वर। उतरले भार वैष्णवांचे।।
धन्य यांचा कुळ धन्य यांचा वंश। धन्य यांची कुशी योगीराज।।
नामा म्हणे आम्हा दाविले नारायणे। झाले चौघे जणे याच क्षेत्री।।
ज्ञानराज माऊलींची जन्मभूमी सिध्द झाली. सन 1975 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.स्व.शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते शासनमान्य श्री.संत सम्राट ज्ञानराज माऊली जन्मसप्तशताब्दी जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगांवी मोठ्या थाटामाटात साजरी झाली. त्याच प्रसंगी शासनाच्या वतीने माऊलींची जन्मभूमी आपेगांव,ता.पैठण,जि.औरंगाबाद हीच आहे असे जाहिर करण्यात आले. या सोहळ्यासाठी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांनीही आपला शुभसंदेश पाठविला.
आपेगांव हेच भारत सरकार व महाराष्ट्र सरकारचे मुळ गौरवस्थान आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब, स्वागताध्यक्ष मा.ना.डॉ.रफीक झकेरीया,महसूल मंत्री म.राज्य,मा.ना.रामनाथजी पांडे शिक्षणमंत्री, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक बाळासाहेब भारदे, श्री.ह.भ.प.श्र्रो.ब्र.नि.कृ. वे.शा.सं.गुरुवर्य विष्णु महाराज कोल्हापूरकर (गुरुजी), अर्वाचिन प्राचीन संत वाङमयाचे संशोधक प्रा.कृष्णा गुरव (सर) या महोत्सवाचे मुळ प्रेरक होते.
त्यानंतर गुरुवर्यांनी आपेगांवी चारही पिठांचे शंकराचार्य गुणवान वादक,गायक सर्वांना एकत्र करुन मुक्ताबाई जन्मसप्तशताब्दी साजरी केली. अनेक संत,विद्वान,मंत्री महोदय सर्व थरातील जनतेला माऊलींचे दर्शन घडविले. सन 1968 साली ज्ञानेश अध्यात्म विद्यासंस्था स्थापन केली. आज पर्यंत लाखो विद्यार्थी ज्ञान घेऊन अनेक स्तरावर विद्यार्थी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. संस्थेत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण तसेच अध्यात्मिक शिक्षण,संगित शिक्षण मोफत दिले जाते. ""इवलेसे रोप लावियले द्वारी। त्याचा वेलू गेला गगनांतरी'' या संत वचनाप्रमाणे आज हे रोपटे फुला फळाला आले आहे. सन 1995 पासून गुरुवर्यांनी चारही भावंडांच्या माता श्रीगुरु रुख्मिणी आई पिता विठ्ठलपंत नावाची ज्योत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरविली. याचा एकच उद्देश ज्या मातापित्यांच्या उदरी चार देव जन्माला आले ज्यांनी विश्र्वात्मक ज्ञानज्योतीने विश्वाला अज्ञान अंध:कारातून ज्ञानज्योतीकडे नेले. ज्यांच्या नावाने आज पर्यंत शास्त्री,पंडीत,महाराज,बुवा स्वत:चे व इतरांचे पोट भरतात. परंतु ज्यांच्या माता पित्यांचा उच्चारसुध्दा होत नाही. हे शल्य मनामध्ये सारखे टोचत होते. म्हणूनच त्यांच्या नावाने ज्ञान जपयज्ञ व ज्ञानराज माऊलींचे भव्यदिव्य 19 कोटी 25 लाखांचे सुंदर,सुबक मंदिर मायभूमीत "माता पिता मुक्तमुदी' साकारत आहे. त्यानिमित्ताने माऊलींचा गर्भ गाभारा, सभा मंडप, भक्त त्रिंबकपंतांचे मंदिर, अजाणवृक्ष सुवर्ण पिंपळ ओटा, गोदावरी गंगेवर घाट या कामाचा शुभारंभ होत आहे. भक्त त्रिंबकपंतांच्या संजीवन समाधी मंदिरापासून होत आहे. अध्यात्मिक कारणही तसेच आहे. संत नामदेवांच्या अभंगातून "भक्त त्रिंबकपंत मुळपुरुषादि। तयाची समाधि आपेगांवी' या प्रमाणे भगवान परमात्मा भक्तवत्सल पांडूरंग परमात्मा यांची बहात्तर पिढीची भगवत भक्ती या घराण्याची
No comments:
Post a Comment