Monday, November 3, 2025

सातवाहन ( अंतिम )

           महाराष्ट्राला संपन्न इतिहास आहे असे बरेचदा वाचनात येते.  छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण राहणार नाही. जुलमी मुघलांच्या तावडीतून महाराजांनी महाराष्ट्र भूमीला परकीय दास्यत्वातून मुक्त केले, हि विजय कथा माहित नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात शोधुनही सापडणार नाही. परंतु महाराष्ट्राचा इतिहास हा फक्त यापुरताच मर्यादित नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी गौरवशाली इतिहासाची परंपरा महाराष्ट्राला जोडली त्याप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गौरवशाली आणि सामर्थ्यशाली इतिहास यापूर्वी आपल्या माय मराठी भूमीमध्ये शिवकाला पूर्वी घडून गेला आहे. दुर्दैवाने फारच कमी लोकांना याबद्दल माहित आहे. प्रत्यक्षात शिवाजीराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास फारच थोडक्यात आपल्याला शिकवला जातो किंवा फारच कमी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक, यादव आणि सातवाहन राजघराण्याविषयी त्रोटक इतिहास नजरेस पडतो. या राजघराण्यांनीही आपापल्यापरीने आपले राज्य सांभाळले आणि वाढीस नेल्याचे दिसते परंतु समग्र इतिहास सहज नजरेस पडत नाही. बरेचदा, या राजांविषयी अधिक माहिती काढायची झाल्यास पुराणांचा आधार घ्यावा लागतो. हा दैदिप्यमान इतिहास निर्माण केला तो सातवाहन साम्राज्याने. उत्तरेतील गुप्त मौर्य घराण्यांनी भारताचे नेतृत्व केले हे सर्वज्ञात आहे, परंतु महाराष्ट्रातील आद्य राजवंश सातवाहन घराण्याने देखील अखंड भारताचे नेतृत्व केले. ते ही थोडी थोडकी नाही तर तब्बल चारशे पन्नास वर्षे. हा सुवर्ण इतिहास पोहचावा हाच या लेखामालिकेच्या मागील उद्देश आहे.
 
 
 
 
 
      भारताच्या आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रामुख्याने तीन भाग पडतात. प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि अर्वाचीन इतिहास हे होय. महाराष्ट्राच्या मध्ययुगात उत्तरेतील मुसलमानी आक्रमणे, दिल्लीची सुल्तानशाही, मुघल, दक्षिणेतील बहामनी सल्तनत, नंतर आलेली निजामशाही, आदिलशाही आणि नंतरचे मराठा साम्राज्य या सगळ्यांचा इतिहास येतो  तर अर्वाचीन इतिहासात ई.स. १८१८ नंतरचा ब्रिटिशांचा इतिहास समाविष्ट होतो.  सातवाहनांनी महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरावर जवळपास ४५० वर्षे राज्य केले.  सातवाहनांना समकालीन असणाऱ्या क्षत्रप आणि नंतरच्या वाकाटक या दोन्ही राजघराण्यांनी महाराष्ट्रावर अनेक वर्षे राज्य केले. त्यांच्या नंतर आलेले बदमीचे चालुक्य २५० वर्षे, राष्ट्रकूट घराणे २३० वर्षे, कल्याणीचे चालुक्य १७० वर्षे, यादव घराणे १५० वर्षे अशी अनेक मोठी राजघराणी महाराष्ट्रात होऊन गेली. यांच्या जोडीला इतरही अनेक लहान लहान राज्ये होती जसे की शिलाहार, कदंब, कलचुरी इ.

       भगवान श्रीरामाच्या इक्ष्वाकू वंशातील अश्मक नावाच्या राजाने या महाजनपदाची स्थापना केली म्हणून या महाजनपदाला अश्मक महाजनपद म्हटले गेले. अश्मक महाजनपदावर राज्य करणाऱ्या याच इश्वाकू वंशाला पुढे शिसोदे म्हटले गेले. भोसले कुळ याच शिसोदे वंशाची एक शाखा आहे छत्रपती शिवाजी महाराज याच कुळातील म्हणून त्यांना रघुकुलराज म्हणजेच भगवान श्रीरामाच्या कुळातील म्हटले गेले. याच शिसोदे कुळाची एक शाखा राज्यविस्ताराला उत्तरेत मेवाडला गेली तिथे शिसोदेचा अपभ्रंश सिसोदिया झाला. या अश्मक महाजनपदाची राजधानी #प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याचे  पैठण ही होती. तर हे महाजनपद इसवी सन पूर्व ६ व्या शतकापर्यंत म्हणजे आज पासून २६०० वर्षे पूर्वीपर्यंत अस्तित्वात होते. त्यानंतर भाषेनुसार प्रांतांची रचना व्हायला लागली तेव्हा वेगवेगळ्या प्रांतांचा उदय झाला. 
    भारताचा प्राचीन इतिहास सिंधु संस्कृतीच्याही आधीपासून अस्तितवात आहे. सिंधू संस्कृती साधारण इ.स. पुर्व ३०००  एवढी जुनी म्हणजेच साधारण ५,००० वर्ष जूनी आहे. त्या आधीही आपल्याकडे वेगवेगळ्या संस्कृती होत्या यात शंका नाही. त्या काळी भारतीय उपमहाद्वीप आणि आजूबाजूच्या प्रदेशात अनेक राजे, महाराजे, राण्यांचे राज्य होते. इ.स. पुर्व ६०० च्या आसपास पहिल्या साम्राज्याच्या खूणा आपण इतिहासात पाहू शकतो. हर्षक, शिशुनाग आणि त्यापाठोपाठ आलेले नंद साम्राज्य व नंतरचे मौर्य साम्राज्य. आपापसात लढून, आपल्या राज्याला दुसरी राज्ये जोडत ही बलाढ्य साम्राज्यं उभी राहिली, पण भारतात कधीही कोणाही एका राजाचा एकछत्री अंमल नव्हता. गंगा नदीच्या मैदानी प्रदेशातील जनपदं, महाजनपदं, दक्षिणेतील राज्ये कधीही एकसंध नव्हती.
  महाभारत काळ किंवा त्याही आधीपासून ज्या केंद्रीय मुख्य सत्ता भारतात होत्या, त्या बहुतांश उत्तरेकडे किंवा वायव्य आणि ईशान्य भारतात होत्या, असं दिसतं. यापैकी बराच मोठा कालखंड तर मगध सत्तेचा होता, म्हणजे ‘पाटलीपुत्र’ ही राजधानी. दक्षिणेत असलेली राज्ये ही बहुधा मांडलिक किंवा अंकित राज्ये होती. प्राचीन भारतातील या साम्राज्यांनी भारत घडवला एवढं निश्चित. या प्राचीन भारतातील १२ साम्राज्यांविषयी थोडी माहिती.
 
       बिंबिसार आणि अजातशत्रू ( इ.स . पुर्व ५५१ ते इ.स.पुर्व ५१९ ): भारतामध्ये येथील लहान लहान राज्ये जिंकून त्यांतून एक मोठे बलशाली साम्राज्य निर्माण करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न झाला तो मगधामध्ये. इ. स. पूर्व सहाव्या शतकात ५५० च्या सुमारास शैशुनाग वंशाने मगधात राज्य स्थापून हळूहळू अखिल उत्तर भारत, हिंदुकुशपासून आसामपर्यंतचा सर्व आर्यावर्त आपल्या साम्राज्याखाली आणला. बिंबिसार हा शैशुनाग घराण्यातील पहिला साम्राज्यकर्ता पुरुष होय.बिंबिसार हा पहिला राजा होता ज्याने आजूबाजूची राज्ये जिंकत मगध साम्राज्याचा पाया रचला. ८०,००० गावे आणि जनपदे त्याच्या राज्यात होती. त्याचा मुलगा अजातशत्रू याने आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत हे काम पुढे सुरु ठेवलं. त्याने वैशाली राज्याच्या लिच्छावी वंशाचा केलेला पराभव सर्वज्ञात आहे.  तेथून पुढे सुमारे दीडशे वर्षांनी या घराण्याची सत्ता संपुष्टात येऊन राजसत्ता नंद घराण्याकडे गेली; नंतर सुमारे शंभर वर्षांनी नंद घराण्याचा उच्छेद करून चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली.इसवी सन पूर्व २३० च्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतामध्ये चंद्रगुप्त स्थापित मौर्य घराण्याचे राज्य होते. भारताच्या दृष्टीने मौर्य साम्राज्याचे महत्त्व विशेष आहे. पहिली गोष्ट म्हणजे चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या - यवनांच्या - आक्रमणाचे निर्दाळण केले ही होय. शिकंदराने भारतावर स्वारी करून वायव्य सरहद्दीजवळच्या पट्ट्यात यवनसत्ता प्रस्थापित केली होती. चंद्रगुप्ताने ती तर नष्ट केलीच, पण त्यानंतर सेल्युकस हा ग्रीक सेनापती प्रचंड सेना घेऊन पुन्हा स्वारी करून आला तेव्हा त्याच्याशी सीमेवरच मुकाबला करून चंद्रगुप्ताने त्याचा निःपात केला व यावनी सत्तेचा कणाच मोडून टाकला. यानंतर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विंध्याच्या दक्षिणेचा म्हैसूरपर्यंतचा भूभाग जिंकून चंद्रगुप्ताने अखिल भारताचे एक साम्राज्य स्थापन केले ही होय. ज्ञात इतिहासात अखिल भारत एका साम्राज्यात एका सत्तेखाली या वेळी प्रथमच आला. यामुळे या घटनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शैशुनाग वंशाने साम्राज्य स्थापन केले होते. पण ते उत्तर भारतापुरते होते. इतिहासकाळात तसे साम्राज्य प्रथमच झाल्यामुळे त्यालाही महत्त्व आहे यात शंका नाही. पण चंद्रगुप्ताचे साम्राज्य अखिल भारतव्यापी होते. त्यामुळे त्याचे महत्त्व अर्थातच असाधारण असे आहे.
त्याचाच वंशज असलेल्या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये बौद्ध धर्माला राजाश्रय होता. कलिंग युद्धातील प्रचंड नरसंहार पाहून उद्विग्न झालेल्या अशोकाने अहिंसावाद स्वीकारला. या अहिंसा वादामुळे वैदिक धर्मातील यज्ञयागामधील पशुबळींवर त्याने बंदी आणली. इतकेच काय तर अहिंसेचे हे तत्त्व सामान्य नागरिकांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले होते. कोणाच्याही घरामध्ये मांसाहार केला जाणार नाही अशी राजाज्ञा सम्राट अशोकाने काढली होती. त्यामुळे बहुसंख्य असणाऱ्या तत्कालीन वैदिक धर्माभिमान्यांना त्यांच्या धार्मिक आणि खाजगी जीवनातील राजकीय हस्तक्षेपामुळे मौर्य साम्राज्य वरील रोष वाढू लागला. तसेच इतक्या पराकोटीच्या अहिंसेमुळे सैन्यात देखील शैथिल्य निर्माण झाले. क्षात्रतेज, प्रखर देशभक्ती, देशाभिमान या मूल्यांचा ऱ्हास होऊ लागला. भारताची ही निद्रिस्त अवस्था वायव्येकडील शक व कुशाण या मध्य-पूर्व आशियातील परकीय वंशीयांना आक्रमण करण्यास खुणावू लागली आणि भारतावर ग्रीक आणि शकांच्या टोळ्या आक्रमण करू लागल्या. मौर्य सेना हे आक्रमण परतून लावण्यास असमर्थ पडू लागली. त्यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेमध्ये मौर्यांबद्दल क्षोभ पसरत गेला. त्यातच शेवटचा मौर्य राजा बृहद्रथ याच्या विलासी वृत्तीची भर पडली. अंतर्गत भांडणामुळे हा राजा परकीय आक्रमण थोपवू शकला नाही. परिणामी मौर्य साम्राज्याची शकले होऊन उत्तर भारतामध्ये शृंग व काण्व या वंशांनी आपली सत्ता स्थापन केली. 





     सातवाहन पहिले मौर्य काळात मौर्य साम्राज्याचे सामंत होते. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर जेव्हा कण्व वंशाला सुरुवात झाली तेव्हा सातवाहन कण्व राजांचे सामंत होते. नंतर कण्व वंशातील शेवटचा राजा सुसर्मनला दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्रामधील सातवाहन नामक एका शूर योध्याने जनशक्ती संघटित करून आपली सत्ता स्थापन केली. त्याचाच पुत्र सिमुक सातवाहन याने ही सत्ता महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता आंध्र आणि कर्नाटक प्रांतापर्यंत तिचा विस्तार केला. त्यामुळे संपूर्ण दक्षिणापथा मध्ये सातवाहन घराणे भारताचे प्रतिनिधित्व करत होते. भागवत पुराण, वायुपुराण, विष्णुपुराण इत्यादी पुराणांमध्ये या घराण्यातील राजांच्या वंशावळीचा उल्लेख आहे. या वंशामध्ये साधारण तीस राजे होऊन गेले. सातवाहन राजांनी आपला राज्यकारभार चालवण्यासाठी तत्कालीन 'प्रतिष्ठान' म्हणजेच आजचे पैठण शहर ही आपली राजधानी बनवली होती असे उत्कीर्ण लेखांवरून कळते. या काळात त्यांनी निर्माण केलेली सुव्यवस्थित सामाजिक व राजकीय स्थिती साहित्य,स्थापत्य व शिल्पकलेची झालेली भरभराट यामुळे महाराष्ट्राने प्रगतीचा उत्कर्ष बिंदू गाठला होता.
   सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याने वैदिक सनातन हिंदू धर्माचा आणि मंदिरांचा ऱ्हास केला होता वर्ण व्यवस्था आणि गुरुकुल भ्रष्ट केले होते. त्यांना पुन्हा स्थापित करण्याचे काम सातवाहन राजांनी केले. सातवाहन राजांनी वर्ण व्यवस्था सुरळीत करून गुरुकुल उभारले संत आणि ब्राह्मणांना अभय दिले. बौद्ध आणि विदेशी आक्रमकांमुळे नष्ट आणि भ्रष्ट झालेल्या अनेक मंदिरांचे पुनरनिर्माण केले आणि अनेक मंदिरे देखील बांधली. कारण बुद्धापेक्षा, बौद्ध धर्म होता. प्रेषितांचे धर्म हे त्यांचे अनुयायी तयार करतात स्वतः प्रेषित नाही. हेच हिंदू धर्मांतर्गत थोडेफार काही पंथांसंबधी बोलता येईल. हे अनुयायी नंतर नंतर अतिरेक तयार करतात. अतिरेक अथवा अतिरेकी विचार म्हणजे केवळ भौतिक अथवा वैचारीक हिंसा असते अशातला भाग नाही तर कुठलेही टोक असू शकते. सम्राट अशोकाने केलेल्या कलींगच्या युद्धानंतर ज्या स्मशानशांततेचा त्याला अनुभव आला, त्याच्यामुळे आलेल्या मानसीक अवस्थेला तोंड देण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी बौद्ध धर्म स्विकारला आणि त्याचा प्रचार चालू केला. हा प्रकार जरी ख्रिस्तपूर्व २३० मधला असला तरी त्याचा हळू हळू परीणाम वाढत गेला. बरं, स्वतः गौतम बुद्धाने ज्ञानप्राप्तिसाठी संसार आणि राज्यावर पाणी सोडले आणि नंतर भिक्षू होऊन मठात राहीला. पण अशोकाने मात्र कितीही चांगले राज्य केले असले तरी बौद्ध धर्म स्विकारताना स्वतःचे सम्राट पद सोडले नाही आणि बळजबरीने बौद्ध धर्म स्विकारायला लावला. भारतीय इतिहासात तो एकच कालखंड असा आहे की जेंव्हा भारतात धार्मिक महत्व आले. नाहीतर राष्ट्राला कधी धर्म या अर्थी आधिही धर्म नव्हता आणि नंतरही. अर्थात याचा अर्थ धार्मिक स्वातंत्र्य होते. नंतरचा काही काळ तर असा होता की जो पर्यंत एकीकडे राज्य करायचे आणि दुसरीकडे अहिंसा असे चालू शकत नाही. तो क्षात्र धर्म होऊ शकत नाही. परीणामी राज्याचा गाडा रुतायला लागला. पुढे अनेक शतकात अनेक घटना घडत गेल्या, पुष्यमित्रशृंगाने ग्रिकांची परत झालेली आक्रमणे आणि नंतर विक्रमादित्याने शक-कुशाणांची आक्रमणे हटवली. पण राजाने पुरस्कृत केलेला - बौद्ध धर्म" हा वेगवेगळ्या रुपाने राहीला. आणि समाजात विघटन करण्यास (त्यातील तत्वांमुळे नाही तर ती चुकीच्या अर्थाने अहंकाराने वापरणार्‍या त्यातील अनुयायांमुळे ) कारणीभूत झाला. बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे संन्यास स्वीकारावा असे नसावे. भारतासह अनेक पौर्वात्य राष्ट्रेही बौद्ध धर्म स्वीकारत गेली परंतु त्यांनी युद्धे केली, हिंसा केली. पण अशोकाने मात्र कितीही चांगले राज्य केले असले तरी बौद्ध धर्म स्विकारताना स्वतःचे सम्राट पद सोडले नाही. अशोकाने श्रीलंका, द.पूर्व आशिया, यवनी प्रांत (सेल्यूकस निकेटरचे राज्य), नेपाळ, उर्वरीत भारत (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र) इ. भागांत आपले प्रतिनिधी पाठवले पण त्यांनी बळजबरीने धर्मप्रसार केल्याचे ऐकीवात नाही. सेल्यूकसच्या राज्यात आणि अशोकाच्या राज्यात घरोबा असल्याने (बहुधा सेल्यूकसच्या मुलीशी चंद्रगुप्ताने लग्न केले होते आणि या दोन्ही राज्यांतील संबंध चांगले होते.) बौद्ध धर्माला तेथे आश्रय मिळाला. अफगाणिस्तानातील बौद्ध धर्म यामुळेच विकसित झाला. मौर्य घराण्यापूर्वीचे शिशुनाग घराणे, बिंबिसार, अजातशत्रू (आम्रपालीची आख्यायिका) इ. राजेही बौद्ध धर्म मानत होते. कुशाण राजेही बौद्धच होते. त्यातील कनिष्क हा भारतील एक उत्तम राज्यकर्ता समजला जातो. तसेच भारतातील ग्रीक राजेही बौद्ध झाले. मिनँडरचे उदाहरण आहेच. सम्राट हर्षवर्धन हा ही बौद्ध होता. चन्द्रगुप्ताच्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार याने हिंदुस्थानचे साम्राज्य टिकवून ठेवले. त्यानंतर आलेल्या अशोकाने शस्त्रबळाच्या जोरावर अहिंसा, भूतदया, वैराग्य, संन्यास, शून्यवाद यांनी संपन्‍न अशा धर्माचा प्रसार केला; आणि चंद्रगुप्ताने निर्मिलेली अत्यंत कार्यक्षम, समर्थ आणि परक्यांवर सहज विजय मिळवू शकणारी राज्ययंत्रणा ढिली केली..

अशोकाच्या मृत्युनंतर त्याच्या विशाल साम्राज्याचे तुकडे पडून लहान लहान राज्ये अस्तित्वात आली. त्यामुळे शंभर-सव्वाशे वर्षे बंद पडलेली यावनी आक्रमणे परत सुरू झाली. डेमिट्रियस, मिनेंडर हे ग्रीक राजे भारतात सहजपणे अयोध्येपर्यंत घुसले. पूर्वी अलेक्झॅन्डरला इंच‌इंच भूमी लढून मिळवावी लागली होती. आता तसे झाले नाही. अशोकाने देशाची प्रतिकारशक्ती नष्ट केली होती. मगध सम्राट बृहद्रथ हा धर्मराज्याच्या वृत्तीने हे शांतपणे पाहात बसला होता. त्यावेळी बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्राचा उदय झाला. त्याने सर्व सूत्रे हाती घेतली, सम्राटाचा वध केला आणि यावनी आक्रमकांना सीमेबाहेर हाकलून दिले. पुष्यमित्राने रणविद्या, प्रतिकारशक्ती, क्षात्रतेज यांचेच केवळ पुनरुज्जीवन केले नाही तर वैदिक संस्कृतीचेही केले. त्याचे प्रतीक म्हणून त्याने अश्वमेध यज्ञदेखील केला होता. पुष्यमित्राच्या शुंगवंशाने ११२ वर्षे  (इ.स.पू. १८४ ते ७२) मगधाचे राज्य केले. अशोकानंतर पन्नास वर्षांच्या अवधीतच मौर्य वंशाची सत्ता संपुष्टात आली.
दक्षिणपथांवरून मौर्यांचं आधिपत्य नाहीसं होताच आंध्रसत्तेची पूर्वेकडून पश्चिमकडं नांदी सुरू झाली. अशातच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या मानचित्रावर स्थान मिळवून देणारा इतिहास घडत होता.कलिंग देशात खारवेलाने स्वतंत्र राज्य स्थापन केले तर महाराष्ट्रात रथिक, भोजक, पेतेनिक यांच्यापैकीच कुणी एक असलेल्या सातवाहन नावाच्या वीराने आपले स्वातंत्र्य उद्घोषित करून स्वतःच्या नावाची तांब्या-शिशाची नाणी पाडली व सातवाहन राज्याची मुहूर्तमेढ रोविली. सातवाहन राजवंश हा महाराष्ट्रातला ‘पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश’ म्हणून जन्माला आला. या वंशाला कोरीव लेखांत ‘सातवाहनकुल’, तर पुराणांत आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटलं आहे, म्हणून त्यांच्या उदयकाळाबद्दल विसंगती आहे. मात्र, त्यांचा इतिहास प्राचीन भारतातल्या अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो. इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवीसनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत खंडाच्या दक्षिण भागावर (दख्खन प्रांत) सातवाहनांनी राज्य प्रस्थापित केलं. 
 सातवाहन सत्ता ही महाराष्ट्राच्याच नव्हे, तर अखिल भारताच्या इतिहासाला चिरंतन भूषणभूत होऊन राहील अशी सत्ता होती. एक तर भारताच्या इतिहासात विंध्याच्या दक्षिणेला निर्माण झालेली साम्राज्यप्रस्थापक अशी ही पहिलीच सत्ता होय. आर्यांच्या वसाहती प्रथम उत्तर भारतात झाल्या. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा सर्व इतिहास उत्तरेत घडलेला आहे. रामायण, महाभारत या सर्व कथा उत्तरेतल्या आहेत. मगधातील शैशुनाग, नंद, मौर्य, शुंग ही सर्व साम्राज्ये उत्तरेतच झाली. मनू, याज्ञवल्क्य, पाणिनी, पतंजली, बुद्ध, महावीर, हे सर्व विंध्याच्या उत्तरेकडचे होत. याचा अर्थ असा की या काळापर्यंत भारताची सर्व संस्कृती ही उत्तर भारताच्या कर्तृत्वाची होती. सातवाहनांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी दक्षिण भारताच्या इतिहासाला आणि संस्कृतीला प्रारंभ करून दिला. त्यांचे दुसरे अलौकिकत्व असे की इ. पू. २३५ ते इ. स. २२५ अशी चारशे साठ वर्षे या एका घराण्याने अखंड राजसत्ता चालविली. त्यातील पहिली दोनशे वर्षे तर तिचे वैभव अव्यय तेजाने सारखे प्रतिपच्चंद्ररेखेप्रमाणे वर्धिष्णूच होत राहिले. त्यानंतर काही वर्षे तिला पडता काळ आला. पण गौतमीपुत्र सातकर्णी या सम्राटाने शकांचा निःपात करून पुन्हा तिचे तेज वृद्धिंगत केले. साडेचार शतकांइतका दीर्घकाळ एकाच घराण्याने सत्ता चालविल्याचे उदाहरण भारताच्याच काय पण जगाच्या इतिहासातही दुर्मिळ आहे. इ. पू. दुसऱ्या शतकापासून इ. सनाच्या चौथ्या शतकापर्यंत ( पुष्यमित्राच्या मृत्यू - पासून गुप्तवंशाच्या उदयापर्यंत ) शिलालेख व नाणी यात महाराष्ट्राचे सातवाहन वगळले तर कोणाही हिंदू राजाचे नाव आढळत नाही. ( कलेक्टेड वर्क्स, खंड १ ला, पृ. ३६ ) [ डॉ. भांडारकरांच्या या विधानाला, नवीन संशोधन पाहता, थोडी मुरड घातली पाहिजे. इ. सनाच्या दुसऱ्या शतकात पंजाब, राजस्थान येथील यौधेयगणांनी कुशाणांचा नाश करून आपले स्वतंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले होते. ' यौधेयानां जयः ' अशा अक्षरांनी अंकित अशी त्यांची नाणी सापडली आहेत. मालवांनीही शकांचा उच्छेद करून तिसऱ्या शतकात ' मालवानां जय: ' अशी मुद्रा करून आपली नाणी पाडली होती. (कॉप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, पृ. २५५ ते २५७.)
     सातवाहनांच्या इतिहासाची उपलब्ध साधन खुपच मर्यादीत असल्यामुळे त्यांच्याशी संबधीत अनेक बाबीमध्ये तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. तेव्हा सातवाहनांच्या इतिहासाशी संबधीत मुद्द्यावर विवीध तज्ज्ञांनी काय मत व्यक्त केली आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत. 

सातवाहन कुळाचे मुळ कोणते ?

       सातवाहनांच्या प्रारंभकाळाबद्दल अनेक वाद आहेत, त्याचप्रमाणे हे घराणे महाराष्ट्रीय की आंध्र, वर्णाने ते ब्राह्मण, क्षत्रिय, की शूद्र, शालिवाहनशकाशी त्यांचा संबंध जोडणे कितपत युक्त आहे, या घराण्यात मातृवंशपरंपरा होती काय याबद्दलही खूप वाद आहेत. या वादामध्ये डॉ. रा. गो. भांडारकर ( अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन ), डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ व २), डॉ. सुखटणकर (दि होम ऑफ दि सो कॉल्ड आंध्र किंग्ज, भांडारकर इन्स्टिटयूट, व्हॉ १, सुखटणकर मेमोरियल एडिशन, पृ. २५१), स. आ. जोगळेकर ( गाथासप्तशती - प्रस्तावना आणि दि होम ऑफ दि सातवाहनाज्, ॲनल्स् ऑफ भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, सिल्व्हर ज्युबिली व्हॉल्यूम, १९१७-४२, पृ. १९६ ), डॉ. के. गोपाळाचारी (अर्ली हिस्टरी ऑफ दि आंध्र कंट्री आणि कांप्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया, खंड २ रा, प्रकरण १० वे ), डॉ. डी. सी. सरकार ( दि हिस्टरी अंड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल, खंड २ रा, भारतीय विद्याभवन - मुंबई, प्रकरण १३ वे ), विद्या- सागर बखले ( राजवाडे व शालिवाहन राजे, विविध ज्ञानविस्तार, मार्च व डिसें. १९२७ ), महामहोपाध्याय वा. वि. मिराशी ( संशोधन मुक्तावली, सर १ ला व २ रा ) अशा मोठमोठ्या पंडितांनी भाग घेतला आहे.
 
सातवाहन घराणे मुळचे महाराष्ट्रीय होते असे मत मांडणार्या तज्ज्ञांची बाजु समजून घेउया.

महाराष्ट्रीय घराणे :-

          सातवाहन हे महाराष्ट्रीय की आंध्र आणि त्यांचे मूळस्थान कोणते हा वादाचा पहिला प्रश्न आहे. पुराणात या वंशाला आंध्र म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे शिलालेख व नाणी यांचा शोध लागेपर्यंत हे आंध्रप्रदेशीय म्हणजे तेलंगणातले राजघराणे आहे व त्याचे मूळस्थान त्या प्रदेशातले आहे असा समज रूढ होता. पण शिलालेख व नाणी उपलब्ध झाल्यावर सर्वच चित्र पालटले. त्यावरून असे दिसून आले की कोणत्याही शिलालेखात वा नाण्यावर सातवाहन स्वतःला आंध्र म्हणवीत नाहीत. पुराणांखेरीज चुकूनसुद्धा त्यांना कोठे आंध्र म्हटलेले नाही. खारवेल, शक, कदंब यांचे हाथीगुंफा, गिरनार, तलगुंडा येथे शिलालेख आहेत. त्यांतही 'सातवाहन' असेच या वंशाला म्हटलेले आहे, आंध्र म्हटलेले नाही. दुसरे असे की सातवाहनांचे प्रारंभीचे सर्व शिलालेख नाशिक, कार्ले, नाणेघाट, कान्हेरी या महाराष्ट्रातील गावी सापडले आहेत. त्यांच्या साम्राज्याच्या अगदी उत्तर काळातील फक्त चार शिलालेख आंध्रप्रदेशात आहेत. प्रारंभीची नाणी सापडली तीही सर्व पश्चिम हिंदुस्थानातच सापडली. वसिष्ठीपुत्र पुलुमायी याचा शिलालेख व याची नाणी आंध्रप्रांतात आहेत. हा उत्तरकालीन राजा होय. यांवरून पंडितांनी असा निष्कर्ष काढला आहे की पुराणे लिहिली गेली त्या काळी सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रप्रदेशातच शिल्लक राहिली होती; तेवढ्यावरून पुराणांनी त्यांना आंध्र ठरविले असावे. वास्तविक ते मूळचे महाराष्ट्रीय होत.
          स. आ. जोगळेकर यांनी आपल्या 'दि होम ऑफ सातवाहनाज' या लेखात एक मोठे अभिनव, प्रबळ व ग्राह्य असे मत मांडले आहे. पुण्याशेजारी तळेगाव दाभाडे म्हणून एक लहानसे गाव आहे. त्याच्या नजीकच्या मावळाला अंदरमावळ - आंध्र मावळ -असे म्हणतात. त्याच्या जवळून दोन मैलांवरून आंध्रा याच नावाची नदी वहाते. ती राजापुरी या कार्ल्यापासून आठ मैलांवर असलेल्या खेड्याजवळ इंद्रायणीला मिळते. नदीवरून पूर्वी प्रदेशाला व लोकांनाही (सरस्वती-सारस्वत, सिंधु - हिंदु ) अशी नावे पडल्याची उदाहरणे अनेक आहेत. आंध्रा या नदीवरून त्या प्रदेशाला आंध्रमावळ व तेथल्या लोकांना आंध्र असे नाव पडले असण्याची पूर्ण शक्यता आहे. त्या परिसरात आजही आंध्रे नावाचे मराठे घराणे राहात आहे. यावरून सातवाहनांचे मूलस्थान आज अंदरमावळ म्हणून प्रसिद्ध असलेले मावळ हेच असावे असे अनुमान करण्यास हरकत नाही.
         लीलावई(लीलावती) या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने गाथासप्तसईकार(सप्तशतीकार) हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान(पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट(मराठी) होत्या असे वर्णन केले आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत सातवाहन राजा कुंतल प्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो असा उल्लेख केला आहे. या पुराव्यांवरून सातवाहन हे महाराष्ट्रीय होते हे पटायला हरकत नाही.
सातवाहन हे महाराष्ट्रीय होत, असे म्हणण्यास दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांची भाषा होय. त्यांचे सर्व शिलालेख महाराष्ट्री भाषेत आहेत. त्यांचा एकही लेख द्रविडी भाषेत नाही शिवाय हालसातवाहनाचा गाथासप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्रीमध्ये आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत, सातवाहन हा राजा कुंतलप्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो, असा उल्लेख केला आहे. हा भाषेचा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यावरून सातवाहनांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित सिद्ध होते.

 कलिंगराज खारवेल याने सातकर्णीवर स्वारी केली होती. हाथीगुंफा येथील शिलालेखात तिचा उल्लेख असून त्या वेळी त्याने आपले सैन्य पश्चिमेला धाडले असे म्हटले आहे. कलिंगाच्या पश्चिमेस महाराष्ट्र येतो. आंध्र दक्षिणेला आहे. सातकर्णी आंध्रात असता तर सैन्य दक्षिणेला धाडले असे म्हटले असते. 'लीलावई' या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान (पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट स्त्रिया होत्या असे वर्णन केले आहे.
         उत्तरकालीन सातवाहनांचे फक्त चार शिलालेख आंध्रात सापडले आहेत. याचा अर्थ असा की , पुराणे लिहिली गेली त्या सुमारास सातवाहनांचे महाराष्ट्रातील राज्य नष्ट होऊन त्यांची सत्ता आंध्रदेशात शिल्लक राहिली होती . 

  सातवाहन आंध्रभृत्य :-

  आता सातवाहन हे मुळचे आंध्र प्रदेशातील होते असा तर्क मांडणार्या तज्ज्ञांची बाजु समजून घेउया.
          पुराणांत त्यांना "आंध्र" असे म्हटले आहे. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पौंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. मुळचा हा पशुपालक समाज. महाभारतात औंड्रांना पौंड्रांसमवेत असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज दक्षीणेत पुरातन कालापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" (औंड्र...ओंडर...आंदर...मावळ) असे म्हटले जाते. सातवाहनांची पहिली राजधानीही      याच प्रदेशात असल्याने हा "आंदर मावळ" शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही.
पौंड्र जसे बंगाल-ओरिसातही होते तसे ते महाराष्ट्रातही होते हे आपण श्री विठ्ठलाच्या संदर्भात पाहिलेलेच आहे. या औंड्र लोकांचे मुलस्थान ओडिसा असण्याची शक्यता अधिक आहे कारण यांना महाभारतात राजा बळीचे पुत्र म्हटलेले आहे. पशुपालक असल्याने त्यांचे दक्षीणेकडे पांगणे व नंतर त्या त्या भागात स्थायी होणे स्वाभाविक आहे. सनपुर्व चवथ्या -पाचव्या शतकानंतर ते सनपुर्व दुस-या शतकाच्या काळात महाराष्ट्र व आंध्रात मेंढपाळ लोकांचेच मोठ्या प्रमाणावर वास्तव्य होते. शेती अजून फारच प्राथमिक अवस्थेत होती व फक्त नद्यांच्या काठांवरच होत होती असे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. यासाठी आपल्याला महापाषाणयुगाचा आधार घ्यायला लागेल.
       आंध्रांच्या अनेक शाखा होत्या. काही ओडिसात, काही आंध्रात तर काही महाराष्ट्रात प्राचीन काळापासून वसल्या असाव्यात. आंध्र नांवामुळे सातवाहन कुळ हे मुळातील आंध्र प्रदेशातील असावे असा बहुतेक विद्वानांचा समज होता. पण पुराणांनी त्यांचा उल्लेख आंध्र जसा केलाय तसाच "आंध्र जातीय" असाही केला आहे. आंध्र जातीय म्हणजे आंध्र कुलीय, त्या प्रदेशातीलच मुळचा असा नव्हे असा तर्क काही विद्वानांनी दिला आहे. आणि असे असले तरी आपल्या प्रतिपादनात प्रत्यवाय येण्याचे कारण नाही कारण आंध्र प्रदेशही औंड्र समाजानेच शासित केलेला प्रदेश असल्याने व ओरिसातही त्यांचे वास्तव्य असल्याने एखादी शाखा प्राचीन काळीच महाराष्ट्रातही वसली असल्यास आश्चर्य नाही.
       मेगॅस्थेनिसने सातवाहन घराण्याबद्दल इंडिका या ग्रंथात लिहिल्याचे पुरावे मिळतात. त्यानुसार मेगॅस्थेनिस लिहितो, "आंध्रातील हे घराणे अतिशय प्रबळ असून त्यांच्या आधिपत्याखालील सुमारे ३० गावांना कडेकोट बांधलेले (बहुधा किल्ले) आहेत. या राजाकडे ११,००,००० चे पायदळ आणि १००० हत्ती आहेत." स्वत: अशोकाच्या राज्यकाळात सातवाहन घराणे अशोकाचे मांडलिक असल्याचे नमूद केलेले दिसते. पुढे स्वतंत्र होऊन त्यांनी राज्यस्थापना केली आणि सुमारे ५०० वर्षांहून अधिक राज्य केले. या राजघराण्याची सत्ता आंध्रमधून गोदावरीच्या खोर्‍यात आणि पुढे महाराष्ट्रात आतपर्यंत वाढत गेली.
डॉ. सुखटणकर यांच्या मते कर्नाटकातील बेल्लारी जिल्हा हे सातवाहनांचे मूलस्थान होय. या जिल्ह्यातील मायाकडोनी व हिरा हदगल्ली येथील कोरीव लेखांत सातवाहनी- हार व सातवाहनी रठ्ठ असे शब्द आले आहेत, हा पुरावा ते देतात. पण बेल्लारी हे सातवाहनांचे मूळस्थान असते तर प्रारंभीच्या सातवाहनांचे अनेक कोरीव लेख तेथे उपलब्ध व्हावयास हवे होते. हे लेख आहेत ते शेवटचा सातवाहन राजा पुलमायी याचे. त्यावरून हे अनुमान काढणे सयुक्तिक नाही. कर्नाटक हा सातवाहनमाम्राज्यात होता. तेव्हा तेथे त्याचे कोरीव लेख असणे हे स्वाभाविक आहे. तेवढ्यावरून ते त्याचे मूलस्थान ठरत नाही.

      वासिष्ठिपुत्र पुळुवामी नंतर सातवाहनांनी पश्चिम महाराष्ट्र गमावून दक्षिणेत स्थलांतर केले होते. त्यानंतर श्री यज्ञ सातकर्णीने परत गेलेला प्रदेश परत मिळवला. यज्ञ सातकर्णीनंतर मात्र सातवाहनांच्या र्‍हासाला सुरुवात होवून पैठणही गमावले गेले व त्यांना कायमस्वरूपी आंध्रात जावे लागले. पुराणांचा काळ त्यानंतरचा त्यामुळे सातवाहनांचा उल्लेख हा पुराणांत आंध्रभृत्य असाच येतो.
                                                       शुङ गानाां चापि यछिष्टं
                                                        क्षपयित्वा बलं तदा ।
                                                        सिन्धुको ह्यन्ध्रजातीयः
                                                        प्राप्स्यतीमाां वसुन्धराम् ॥
        पुराणातील वरील श्लोकात सातवाहनांचा उल्लेख हा ‘आंध्र’ असा आला आहे. त्यामुळे त्यांच्या स्थानाविषयी शंका निर्माण होतात. वास्तविक काही होण्याचे कारण नाही पण काही अभ्यासकांनी सातवाहन हे मुळचे आंध्र प्रदेशातील होते असा सिद्धांत मांडल्याने त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. या अभ्यासकांच्या नुसार जर त्यांचे मूळ आंध्रात होते तर लगेच सातवाहन राजे महाराष्ट्रात आले आणि इथे विशाल राज्य उभे केले आणि पुन्हा आंध्र प्रदेशात गेले असेच म्हणावे लागेल, जे संभवनीय अजिबात वाटत नाही. भांडारकर यांनी नाशिक मधल्या एका लेखात असलेले धेनुकाकट हे नाव वाचून, ते गाव आंध्र मधील धरणीकोट असावे असे सांगितले. अर्थात या गोष्टीला पुरावा काही नाहीच. कारण कार्ले किंवा घोरावडेश्वर येथील लेण्यांमध्ये सुद्धा धेनुकाकटचा उल्लेख येतो आणि तो म्हणजे तेथील रहिवाशांनी दिलेल्या दानाविषयी येतो. आता आंध्र मधील एखाद्या शहरातील एखादा व्यापारी कार्ले लेण्यांसाठी दान देण्याचे कारण काय ? तर सातवाहन यांचे मूळ स्थान हे आंध्र नसून महाराष्ट्र असले पाहिजे कारण महाराष्ट्रातच त्यांचे सर्वाधिक लेख आढळले आहेत आणि सुरुवातीच्या राजांची नाणी सुद्धा इथेच सापडली आहेत. याला मजबूत दुजोरा मिळतो तो म्हणजे टोलेमी म्हणतो की ‘पुळूमावी राजा प्रतिष्ठान (सध्याचे पैठण) नगरीमध्ये राज्य करतो’. आंध्र भागात सातवाहनांचा विस्तार नक्कीच झाला पण तो नंतर झाला. त्यामुळे जेव्हा पुराणे लिहिली तेव्हा सातवाहन हे आंध्र मध्ये असल्याने त्यांना ‘आंध्र’ असे नाव दिले गेले हे साहजिक आहे.

 भाषा

     महाराष्ट्राला भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात बलाढ्य तर केलेच पण आजच्या मराठी भाषेची पूर्वज माहाराष्ट्री प्राकृत भाषेलाही देशव्यापी माहात्म्य प्राप्त करून दिले. इतके कि उत्तर भारतातील विद्वानही माहाराष्ट्री प्राकृत भाषेला सर्वश्रेष्ठ मानत आपल्या साहित्यकृती या भाषेत लिहित असत.
आजच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आर्थिक आणि भाषिक पाया या राजघराण्याने घातला असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
सातवाहन हे महाराष्ट्रीय होत, असे म्हणण्यास दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांची भाषा होय. त्यांचे सर्व शिलालेख महाराष्ट्री भाषेत आहेत. त्यांचा एकही लेख द्रविडी भाषेत नाही शिवाय हालसातवाहनाचा गाथासप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्रीमध्ये आहे.
         सातवाहनांचा प्राकृत वाङ्मयालाही उदार आश्रय होता. या काळातल्या हाल नृपतीनं (सतरावा) सातशे गाथांचा निवडक संग्रह ‘गाहा सत्तसई (गाथा सप्तशती)’ या नावानं प्रसिद्ध केला होता. कोट्यवधी गाथांमधून या सातशे गाथा निवडण्यात आल्या असून, त्या विविध दर्जाच्या कवी-कवयित्रींनी रचलेल्या आहेत. या काळातला दुसरा सुप्रसिद्ध प्राकृत ग्रंथ ‘बृहत्कथा’ हा होय. त्याची इसवीसनाच्या अकराव्या शतकात सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी अनुक्रमे केलेली ‘कथासरित्सागर’ आणि ‘बृहत्कथामंजरी’ ही संस्कृत रूपांतरंच सध्या प्रसिद्ध आहेत.
राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत, सातवाहन हा राजा कुंतलप्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो, असा उल्लेख केला आहे. हा भाषेचा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यावरून सातवाहनांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित सिद्ध होते. विमल सुरी लिखित जगातील रामावरील पहिले महाकाव्य “पउमचरीय’, हालाच्या “गाथा सप्तशती” सारखा नितांतसुंदर काव्यसंग्रह, “तरंगवई”, “पउमचरीय”सारखे महाकाव्य यातून आद्य मराठीचा पाया तर भक्कम केला गेलाच पण वररुचीच्या “प्राकृतप्रकाश” या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्री भाषेला समृद्धी दिली.
          कलिंगराज खारवेल याने सातकर्णीवर स्वारी केली होती. हाथीगुंफा येथील शिलालेखात तिचा उल्लेख असून त्या वेळी त्याने आपले सैन्य पश्चिमेला धाडले असे म्हटले आहे. कलिंगाच्या पश्चिमेस महाराष्ट्र येतो. आंध्र दक्षिणेला आहे. सातकर्णी आंध्रात असता तर सैन्य दक्षिणेला धाडले असे म्हटले असते. 'लीलावई' या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान (पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट स्त्रिया होत्या असे वर्णन केले आहे.

सातवाहन - मूळ पुरुष

आपले दुर्दैव की या राजाबद्दल आपल्याकडे अस्सल साधने फार तोकडी आहेत. याचे कारण म्हणजे त्या काळात लिखाण फार कमी झाले किंवा इतिहास जतन करून ठेवायला हवा असा विचार तेव्हा कुणाच्या मनाला शिवला नाही. विविध लेण्यांमध्ये असणारे विविध लेख यांवरून आपल्याला त्या काळातील समाजजीवनाची, तसेच राजांची माहिती मिळते इतकेच. पुराणात सातवाहन राजांच्या वंशावळी दिल्या आहेत मात्र सध्या उपलब्ध असलेली पुराणे ही तेव्हाची लिहिलेली पुराणे असतील का अशी शंका घ्यायला सहज वाव आहे. आता हेच बघा, वायू, ब्रम्हांड, भागवत व विष्णू ही सर्व पुराणे ३० सातवाहन राजे होऊन गेले असे सांगतात मात्र प्रत्यक्षात नवे देताना ही संख्या कमी होते. मत्स्य पुराण २९ राजे सांगते पण नावे ३० देते. आता अभ्यासकांनी ३० हा आकडा मान्य करून पुढे अभ्यास केला ती गोष्ट वेगळी. सातवाहनांचा कालावधी कोणता याबाबत पण अभ्यासकात एकमत नाही. कुणी म्हणते ख्रिस्तपूर्व पहिले शतक तर कुणी म्हणते दुसरे.
             महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पुराव्यानिशी लिहायचा झाल्यास तो सातवाहनांन पासून लिहावा लागेल. कारण त्यांनीच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले. मौर्यांनी जशी ग्रीक आक्रमणे परतवून लावली त्याच प्रमाणे सातवाहनांनी शक आणि क्षत्रपांची आक्रमणे परतवून लावली. त्यांच्या पासूनच महाराष्ट्रात एकछत्री अंमल सुरू झाला. इ.स.पू. २३० ते इ.स. २३० अशी ४६० वर्षे राज्य करणारे सातवाहन हे महाराष्ट्रातील एकमेव घराणे होय. सातवाहनांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात नवे दालन उघडले. त्यांच्या काळात महाराष्ट्राला स्थैर्य प्राप्त झाले व त्याची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली. महाराष्ट्रातील तेर, पैठण यासारख्या व्यापारी शहरांचे पाश्चिमात्य जगातील रोम, अथेन्स सारख्या शहरांशी प्रत्यक्ष संबंध आले. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात सातवाहन काळापासून झाली. भडोच, नालासोपारा, कल्याण, ठाणे, चौल ही पश्चिमी तटावरील काही महत्त्वाची बंदरे होत. तेथून आंतरराष्ट्रीय व्यापार चाले.
               या राजघराण्यातील राजांनी स्वतःला ‘ दक्षिणापथपती ', 'तिसमुद्दतोय-पितवाहन ', 'अप्रतिहतचक्र ', अशी बिरुदे धारण करून त्याद्वारे आपल्या सत्तेचे सामर्थ्य प्रदर्शित केले होते. ते त्यांनी शक - क्षत्रपांचे उच्चाटन करून सार्थ करून दाखवले. महाराष्ट्राच्या विश्वसनीय इतिहासास सातवाहनांच्या राजसत्तेपासूनच प्रारंभ होतो ही राजसत्ता सातवाहननामक पुरुषाने इ. स. पूर्व २३० च्या सुमारास स्थापन केली असे काही तज्ज्ञांचे मत आहे. पुराणात या राजवंशाची माहिती दिली आहे. ती ढोबळ मानाने पुष्कळ बरोबर आहे. पण अलीकडे स्वतः सातवाहनांची सहस्रावधी नाणी व अनेक शिलालेख सापडले आहेत. त्यांच्या आधारे त्यांच्या इतिहासातील घटनांना पुष्कळसे निश्चित रूप देणे शक्य झाले आहे. पुराणान्वये शिशुक किंवा शिनुक हा सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष होता. पण अलीकडे सातवाहन या पुरुषाचे नाव असलेलीच नाणी सापडली आहेत त्यावरून सातवाहन हाच या राजवंशाचा मूळ पुरुष होय व त्याच्यावरून या वंशाला हे नाव पडले, असा सिद्धांत म. म. वा. वि. मिराशी यांनी मांडला आहे. (संशोधन मुक्तावली -सर २ रा, पृ. ६४.) त्यामुळे या वंशाला सातवाहन हे नाव कसे पडले असावे याविषयीच्या आतापर्यंतच्या सर्व उपपत्ती काल्पनिक ठरून रद्द झाल्या आहेत. प्रा. मिराशी यांच्या मते सिमुक हा सातवाहन या मूळ संस्थापकाचा नातू असावा. म्हणजे जुन्या कल्पनेप्रमाणे सातवाहनांचा जो आरंभकाळ ठरतो त्याच्या मागे दोन पिढ्या तो न्यावा लागतो. सातवाहन’ हे वंशनाम कशावरून रूढ झाले, यावरही मतांतरे आहेत. या नावाचा त्यांचा एक पूर्वज होता, हे एक मत आहे; तर या वंशातील राजे सूर्यवंशाशी नाते सांगत असल्याने सात (घोड्यांचे) वाहन- रथ असलेला आराध्य देव सूर्य; म्हणून सातवाहन हे नाव त्यांनी घेतले, हेही मत आहे.

      मुळात या प्रकरणाची सुरुवात इथून होते की याला सातवाहन हे नाव का पडले? महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीला दंतकथा आहे आणि हे सुद्धा याला अपवाद नाही. याबाबत अनेक विद्वानांनी आपापले डोके चालवून मत मांडले आहे आणि त्या सर्व मतांचे संकलन मिराशी यांनी आपल्या पुस्तकात अगदी सविस्तर दिले आहे. त्यातील काही उल्लेख हे फक्त मी इथे मांडतो आणि ते उल्लेख कुठून आले याचे नाव.
 १ )  त्या वंशातील राजांनी इतर राजांना वाहने दिली होती किंवा इतर राजांनी या वंशाला वाहने दिली होती.
 २ )  ते सूर्याचे उपासक होते कारण सूर्याच्या रथाला सात घोडे असतात म्हणून सातवाहन
३ )  सात नावाचा एक यक्ष होता. तो आपणापासून झालेल्या एका ऋषीकन्येच्या मुलाला सिंहाचे रूप धारण करून पाठीवर बसवून     नेत असे म्हणून सातवाहन- ‘कथासरीत्सागरा’
           अशा प्रकारची अनेक मते आढळतात अर्थात त्यांना संदर्भाचा काडीचाही आधार नाही त्यामुळे सातवाहन हे नाव का पडले वगैरे याच्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपण लक्षात इतकेच ठेवले पाहिजे की यांच्यानंतर या वंशाला सातवाहन हे नाव मिळाले व पुढ त्याचे शालिवाहन असे झाले.
              सातवाहन हे नाव असलेली त्याची तांब्याची व शिशाची अनेक नाणी सापडली आहेत. याशिवाय पैठण येथेसुद्धा सातवाहनाची अश्र्वछाप नाणी सापडली आहेत. त्याने राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला मूलक व अश्मकांचे राज्य जिंकून घेतलेले असावे. म्हणजेच गोदा- प्रवरा - दुधना या खोऱ्यातील प्रदेश होय.
               त्यावेळी सातवाहनांची राजधानी होती प्रतिष्ठान अर्थात पैठण. काही इतिहासकारांच्या मते जुन्नर ही सातवाहनांची राजधानी होती. मात्र आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे की जुन्नर ही क्षत्रप राजांची तर पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. पैठण हीच त्यांची सुरुवातीपासून, दक्षिणेकडे स्थलांतरित होईपर्यंतची राजधानी होती. तिचे उल्लेख आपल्याला वेगवेगळया साहित्यातून आलेले दिसतात. 
            सातवाहन राजांची वंशावळ मत्स्य, वायू, ब्रह्मांड, विष्णू आणि भागवत या पुराणांत दिली आहे. परंतु त्यातील राजांचा परस्परांशी मेळ बसत नाही. मत्स्य पुराणात एकूण तीस राजांची नावे असून त्या सर्वांचा मिळून पाचशे वर्षांचा कालावधी समजला जातो. 
          मूळ 'सातवाहन' असे नाव असलेले नाणे उत्खननात सिमुकाच्या आधीच्या थरांत सापडलेले आहे त्यामुळे सिमुकाच्या आधीही सातवाहन राजा होता हे मान्य करण्यास काहीच हरकत नाही. 
छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ), हैद्राबाद, अकोला येथे जमिनीवर आणि कोंडापूर, नेवासे येथे उत्खननात सातवाहन नामक राजाची नाणी सापडली आहेत. त्यावर पुढील बाजूस हत्ती आणि सभोवती 'रञो सिरि सादवाहनस' (राजा श्री सातवाहन) आणि मागील बाजूस उज्जैन चिन्ह आहे. हा सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष असावा कारण ह्याचेच नाव पुढे कुलाला पडलेले दिसते.वरंगळ येथे अजून एक आहे (चट्टोपाध्याय). अन्यथा पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख आंध्र म्हणून आहे. सातवाहन या नावाने नाही.
        सिमुख सातवाहन हा आद्य सातवाहन समजला जात असे, पण सातवाहन असे नाव असलेली तांब्याची आणि शिशाची नाणी नासिक आणि नेवासे येथील उत्खननात मिळाली असल्यामुळे सातवाहन हाच या घराण्याचा मूळ पुरुष होय असे अलीकडे मानले जाते. याच्याच नावावरून सातवाहन कुलाची सुरुवात झाली. सिमुखाचा हा पिता अथवा आजा असावा तथापि त्यांचे नक्की नाते तसेच आद्य सातवाहनाचा राज्यविस्तार याबद्दल नक्की सांगता नाही. सिमुक या कुळातील मुख्य राजा होताच हे मान्य. पण आद्य सातवाहन हाही मुख्य राजा असावा.ज्याअर्थी त्याची स्वतंत्र नाणी आहेत त्याअर्थी त्याने स्वतंत्र राज्य स्थापन केले होते हे निर्विवाद. अर्थात सिमुकापासूनच सातवाहन घराणे नावारूपाला आले यात काहीच संशय नाही.
      कण्वाला पराभूत मूळ सातवाहनानेच केलेले असावे किंवा त्यानंतर सातवाहनांचा राज्यविस्तार कण्वांना पराभूत करून सिमुकाने केलेला असावा. पण कालमापनाने पाहिल्यास हेही जुळत नाही. कण्व सत्ता ही साधारण इ.स.पूर्व७५ ते इ.स.पूर्व २६ अशी आहे तर सातवाहनांचा काळ त्याही आधीचा म्हणजे साधारण इ.स.पूर्व २३० असा येतो. पुराणे आणि काही शिलालेखांवरून हा काळ निश्चित केला आहे. म्हणजे कण्वांचा पराभव हा सातवाहनांच्या नंतरच्या पिढीच्या काळात झाला असावा. अशोकाच्या मृत्युनंतरच्या दशकभरातच सातवाहन मौर्यांचे मांडलिकत्व झुगारून देउन सत्तेवर आले. कण्व-सातवाहन यांत संघर्ष झाल्याचे कधी कुठल्याही शिलालेखात आलेले नाही हेही विशेष.

सातवाहन हे कोणत्या जाती, धर्माचे होते?

      सातवाहन हे राजे वर्णाने ब्राह्मण होते की क्षत्रिय होते की शूद्र होते, हा प्रश्न बराच वादग्रस्त आहे. दंतकथा व पुराणे याअन्वये, मूळ सातवाहन हा ब्राह्मण स्त्री व नागपुरुष यांच्यापासून झाला, असे आहे. नाशिक मधील लेणी क्रमांक ३ मध्ये व्हरांड्यााच्या मागील भिंतीवर दरवाज्याच्या वरील बाजूस असणाऱ्या लेखात याचा उल्लेख आढळतो.   गौतमी बलश्री ( महाराज गौतमीपुत्र सातकर्णी याची माता ) हिने कोरविलेल्या लेखामध्ये गौतमीपुत्र सातकर्णी याच्याबद्दल वर्णन आलेले आहे. या लेखातील सातव्या ओळीवरून आपल्याला गौतमीपुत्र सातकर्णी याचे कूळ कळते. ‘एककुसस एकधनुधरस एकसूरस एकबम्हणस राम’ याचा अर्थ ‘असामान्य नियन्ता, अप्रतिम धनुर्धर, अद्वितीय योद्धा, अनुपम ब्राह्मण होता. हा संपूर्ण लेख मिराशी यांनी आपल्या पुस्तकात छापला आहे. आपल्या पुत्राचा 'एक ब्राह्मण', 'क्षत्रियदर्पमानमर्दन' असा गौरव केला आहे. 'एक बाह्मण' 'खतियदपमानमदन' असे मूळ शब्द आहेत. त्याचप्रमाणे तिने स्वतःला ' राजर्षि- वधू' असे म्हणविले आहे. यांवरून दंतकथा अगदीच त्याज्य होत, यात शंका नाही. पण वरील पदव्यांवरून निरनिराळे वाद निर्माण होतात, हेही खरे आहे. 'एक बह्मण' याचा ' असामान्य ब्राह्मण' असा सेनार्ट याने अर्थ केला आहे व 'ब्राह्मण या नावाला एकमेव योग्य ' असा बुल्हरने केला आहे. डॉ. भांडारकर 'ब्राह्मणांचा एकमेव प्रति- पालक' असा अर्थ घेतात. तो जास्त संयुक्तिक वाटतो. गौतम बलश्री स्वतःला राजर्षि- वधू म्हणविते. यावरून त्या घराण्याचे क्षत्रियत्वच सिद्ध होते. म्हणून डॉ. भांडारकरांचा अर्थ ग्राह्य वाटतो. पण ' खतिय-दप - मान-मदन' अशीही गौतमीपुत्राला पदवी आहे. ती वरील अनुमानाच्या विरुद्ध जाते. पण तेथे ' खतिय' याचा अर्थ सर्व क्षत्रिय राजे असा घेण्याचे कारण नाही. क्षत्रिय ही एक त्या काळी स्वतंत्र जमात असू शकेल. त्या काळी शूद्र हेही एका वर्णाचे नाव नसून जमातीचे नाव असल्याचे उल्लेख आहेत. डॉ. जयस्वाल यांच्या मते, येथे खतिय हे एका जमातीचे नाव मानणं युक्त आहे. सध्या खत्री नावाची जमात मुंबई प्रांतात व अन्यत्रही आहे. डॉ. कुमारी भ्रमर धोप यांनी 'दि कास्ट ऑफ दि सातवाहन रूलर्स आफ दि डेक्कन' या आपल्या लेखात वरील विवेचन करून, सातवाहन क्षत्रिय होते, असे अनुमान काढले आहे. ( इंडियन कल्चर-ऑक्टो. १९३४, पृ. ५१३. शूद्र ही एक जमात होती, असे त्याच अंकात बी. सी. लॉ यांनी आपल्या लेखात सांगितले आहे. पृ. ३०४.) मनूने शकयवनपल्हवपारद यांना संस्कारलोपामुळे शूद्रत्व पावलेले क्षत्रिय असे म्हटले आहे. गौतमीपुत्राने शकांचा निःपात केला. तेव्हा त्यांना उद्देशूनही ' खतिय' हा शब्द वापरलेला असण्याचा संभव आहे. या सर्वावरून सातवाहन हे क्षत्रिय असावे असे मानण्याकडे कल होतो. काहींनी सातवाहन राजांना बौद्ध घोषित केले त्यांनी काही बौद्ध भिक्खूंना राज्यात आश्रय दिला व बौद्ध स्तूप बांधायला दानधर्म केला याचा अर्थ ते बौद्ध होते असा होत नाही त्याचा काही संबंध नाही सातवाहन वैदिक हिंदू धर्माचे अनुयायी होते त्यांनी शालिवाहन शक ही हिंदू कालगणना सुरू केली. सातवाहन राजांनी वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ यांसारखे यज्ञ त्यांनी केले याची नोंद नाणेघाट शिलालेखात आहे जे वैदिक हिंदू करतात.

        सातवाहन घराण्यात एकुण तीस राजे झाले. सातवाहन हे आगम (शैव ) धर्म पाळत होते त्याचा स्पष्ट उल्लेख नाशिक शिलालेखात "आगमाननिलया", म्हणजे आगम प्रणित धर्म पाळणारे असा येतो. राजांची नांवे शिवश्री, स्कंद, पुलुमावी, शक्तीश्री, सिमुख (सं शिवमुख), शिवस्वाती अशी बव्हंशी शिव-शक्ती वाचकच आहेत. सातवाहनांनी वैदिकांच्या समाधानासाठी यज्ञही केला होता. त्यामुळे वेदिश्री असेही एक यज्ञवाचक नांव येते. एक राणी तर नागणिका (नाग वंशीय) असल्याचेही दिसते. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की समाजात बंडाळी माजलेली असताना या वंशाने हातात तलवार घेतलेली दिसते आणि त्याचेच अनुकरण पुढे अनेक वर्षांनी मराठ्यांच्या इतिहासात झाले. असो! पण त्याकाळचा ब्राह्मण समाज हा तितका कर्मठ नव्हता हे त्यानी दुसऱ्या जातीतील केलेल्या विवाहांवरून स्पष्ट होते. नागनिका तसेच महाक्षत्रप रुद्रदमन याची कन्या या काही ब्राह्मण नव्हत्या.  
आपल्या कार्यकाळात त्याने दोन अश्वमेध व एक राजसूय यज्ञ केले. याच्या कारकिर्दीत मध्य भारत सातवाहनांच्या अधिपत्त्याखाली असल्याचे आढळते. तो वैदिक धर्माचा पोषक असून अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीतही त्याचे धोरण उदार होते. त्याने बौद्धांच्या तत्कालीन संघांना बरीच मदत केली होती. सध्या मुंबई येथील कार्ले नावाच्या बौद्ध संघाला त्याने त्यावेळी करजक नावाचे गाव दान केले होते. त्याने आपल्या कालखंडात अनेक नाणी पाडली. त्यातील बर्‍याचशा नाण्यांवर सत्करणीचा चेहरा मुद्रित केलेला आढळतो. त्याने जवळपास २० वर्षे शकांबरोबर संघर्ष केला. अखेर नाशिकमधील गोवर्धनजवळ त्याने शक राजा नहपान याच्याशी युद्ध करून त्याला पराजित केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे युद्ध होते. या युद्धानंतर सातवाहनांचा उत्कर्ष सुरू झाला. शक राज्यकर्ता नहपानच्या पराभवानंतर सत्करणीने त्याचे सर्व शिक्के ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्याचे मुद्रण केले.

        या कुळातला मुख्य आणि आद्य राजा सिमुक सातवाहन हा कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते. कण्व हे कुळ ब्राह्मण होते. तेही यापूर्वीच्या शुंग राजांचा घात करून सत्तेवर आले होते. शुंगही ब्राह्मणच कुळ असावे. ब्राह्मण राजांना मारून सत्तेवर आल्याने परत ब्राह्मणांना आश्वासित करणे गरजेचे वाटलेले असू शकते असा एक कयास , त्यामुळे या केवळ एका लेखात (तेही गौतमीच्या) तिच्या स्वतःच्या मुलाचा उल्लेख "एकब्राह्मण" असा एक उल्लेख केलेला असावा. ( इतर कुठेही असे लिखाण दिसत नाही). याचा अर्थ हे सातवाहनांचे कुळ ब्राह्मण असले पाहिजे असा असेलच असे वाटत नाही. हा शिलालेख हा गौतमीपुत्र मरण पावल्यानंतर किंवा आजारपणाने सत्तेपासून दूर असताना त्याची आई गौतमीने कोरून घेतला आहे. कदाचित गौतमी ब्राह्मण कुळातली असावी आणि प्रतिष्ठित घरातली असावी. . याच कुळातली दुसरी एक राणी नयनिका/नागनिका ही 'नाग' कुळातली होती असे समजले जाते. या स्त्रीने श्रौत इ. वैदिक रितीभाती नवरा गेल्यानंतरही पाळलेल्या दिसतात (हे स्त्रीने करण्याची पद्धत नाही, पण तरी केले/करवून घेतले आहेत असा उल्लेख आढळतो). परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला असे त्या शिलालेखामध्ये म्हटले तरी बहुदा वर्णसंकर थांबवला गेला नसावा कारण लग्ने क्षत्रपांशी, नागांशी आणि कदाचित ब्राह्मणांशीही होत असावीत. तेव्हा हे राजे तोंडाने (एखाद्या शिलालेखात) काही बोलत असले तरी करताना राज्यविस्तारासाठी काही लागेल ते करत होते (म्हणजे वर्णसंकर!) असे दिसते.
         दुसरे शक्यता अशी की जैनांमध्ये, किंवा बौद्धांमध्ये राजांच्या मूर्ती करण्याची पद्धत होती तशी ब्राह्मण राजांमध्ये स्वतःच्या मूर्ती करून घेण्याची पद्धत नव्हती. उदा. (ब्राह्मण नसलेल्या) कनिष्काचा पुतळा आढळतो. तसेच शुंगांनी जरी बरेच बांधकाम/शिल्पकाम करवून घेतले असले तरी मूर्ती तयार करून घेतल्या आहेत का हे पहावे लागेल. सातवाहनांनी (राणीसकट) सर्वांच्या मूर्ती दगडात तयार करून घेतलेल्या दिसतात.  यातही असे मत मांडले जाते कि बौद्धांमध्ये मूर्ती कोरण्याची पद्धत कनिष्काने सुरु केली असे मानण्यात येते. बहुधा चौथ्या धम्मपरिषदेमध्ये हा प्रस्ताव संमत करून घेतला गेला. सातवाहनांच्या प्रतिमाही फक्त नाणेघाटातच आढळतात, इतरत्र कुठेही नाही तेव्हा नाणेघाटाचे हे महान कार्य लोकांवर ठसवण्यासाठीच या मूर्ती कोरण्यात आलेल्या असाव्यात. पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत.

 सातवाहन ब्राह्मणच होते असा सबळ पुरावा त्या शिलालेखाशिवाय दुसरा मिळालेला नाही हेही खरे. पण त्यावेळी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. पांडवलेणीतल्या त्याच लेखात गौतमीपुत्राचे खतियदपमानदमन हे बिरुदही कोरलेले आहे. स्वतः क्षत्रिय असताना तो असे बिरुद धारण करेल हे तसे असंभवनीयच वाटते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. जातीव्यवस्था त्याकाळात नव्हतीच. अशोकानंतरच्या काळात काहिश्या खंडित झालेल्या वैदिक प्रथांचे पुनरुज्जीवन सातवाहनांनी केले होते. नाणेघाटावरील शिलालेखाविषयीच्या सातवाहनांच्या यज्ञयागाचे उल्लेख विस्ताराने मांडलेले आहेत. समुद्रबंदी तर नव्हतीच नव्हती. सातवाहन-क्षत्रप संघर्षाचे मूळ कारणच मुळात समुद्रावरून चालत असलेल्या व्यापारावर अधिकार गाजवण्यावरून आहे.
   तर कही तज्ज्ञांच्या मते काही उत्तर भारतीय  इतिहासकारांनी नाशिक शिलालेखाचा ज्याला नाशिक प्रशस्ती म्हटले जाते याचा चुकीचा अर्थ काढून त्यांना ब्राह्मण घोषित तर केलेच पण क्षत्रिय विरोधी देखील घोषित केले. नाशिक प्रशस्ती मध्ये क्षत्रियांचा मानमर्दन केला असा उल्लेख आहे असं यांचं म्हणणं आहे पण जे स्वतःच क्षत्रिय आहेत ते स्वतःच्याच वर्णातील लोकांचे मानमर्दन का करतील…? आणि सातवाहनांची लढाई कुठल्या क्षत्रियांबरोबर झाली..? त्यांची लढाई तर विदेशी शकां बरोबर झाली आणि हे शक स्वतःला क्षत्रप म्हणत होते. तर त्या शिलालेखात सातवाहनांनी शकांचे म्हणजे क्षत्रपांचे मानमर्दान केले असे वर्णन आहे. तर त्याचा चुकीचा अर्थ क्षत्रप ऐवजी क्षत्रिय असा यांनी काढला.
दुसरी गोष्ट त्या शिलालेखात ब्राह्मण शब्दाचा उल्लेख आहे तर ब्राह्मणांना भूमिदान व दान धर्म केले असा तो उल्लेख आहे याचा अर्थ त्यांनी ते स्वतः ब्राह्मण आहे असा लावला.
सनातन वैदिक आर्य हिंदू धर्मानुसार राजा फक्त क्षत्रिय असतो त्यामुळे सातवाहन हे क्षत्रियच होते 450 वर्ष इतक्या दीर्घकाळ राज्य करणे व विदेशी आक्रमकांपासून साम्राज्याचे रक्षण करणे हे क्षात्र तेज एका क्षत्रियातच असते.
 तरी हा प्रश्न वादग्रस्त असून त्याचा समाधानकारक निर्णय लावता येत नाही हे खरे आहे. पण इतिहासाच्या दृष्टीने त्याला फारसे महत्त्व नाही.

सातवाहनांच्या इतिहासाची साधने :-

        सातवाहनांच्या इतिहासाची साधने कोणती याचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. कारण त्या शिवाय आपल्याला सातवाहन कळणार नाहीत आणि मग या राजाचा संदर्भ कुठून आला वगैरे प्रश्न उपलब्ध होतील. जी अत्यल्प साधने आपल्याकडे आज उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून मग सातवाहन यांच्याविषयी काही तर्क आपण मांडू शकतो.
      सातवाहनांच्या इतिहासाची साधने जर आपण पाहायला गेलो तर त्यात मुख्यत्वे, लेण्यांमध्ये असणारे ब्राह्मी लिपीतील शिलालेख, विविध सातवाहन राजांची आढळणारी नाणी, हल सातवाहन राजाने लिहिलेली गाथा सप्तशती आणि विविध पुराणातील सातवाहन राजांचा उल्लेख एवढीच काय ती माहिती आपल्याकडे उपलब्ध होते. अर्थात पुराणात पण कालावधीनुसार बदल होत गेले त्यामुळे पुराणे किती ग्राह्य धरणार हा प्रश्न राहतोच .
लेण्यांमधील ब्राह्मी शिलालेख-
           महाराष्ट्रात असंख्य लेणी आहेत. काही बौद्ध धर्मीय आहेत, काही हिंदू आहेत तर काही जैन. या लेण्यांमध्ये भरपूर शिलालेख कोरलेले आहेत. यातील बहुतांश लेख हे बौधधर्मीयांचे आहेत. समाजातील सर्व घटकांचे लेख यात कोरलेले आपल्याला दिसून येतात. तर हे लेख कुठे आढळतात? त्यांचे स्थान कुठे असते?- हे लेख लेण्यांमधील प्रवेशद्वारावर, आतील तसेच बाहेरील भिंतींवर, स्तुपांवर, पाण्याच्या टाक्यांवर दिसून येतात. हे लेख प्रामुख्याने दानाविषयी आहेत परंतु काही लेख जसे की नाणेघाटातील नायनिका हिचा लेख किंवा पांडवलेण्यातील बलश्रीचा लेख हे सातवाहन राजघराण्याची माहिती देतात. बौध लेखांच्या मानाने हिंदू लेख आणि जैन लेख यांची संख्या फारच कमी आहे.
         या लेखाची लिपी ही ब्राह्मी असून, भाषा ही प्राकृत आहे. या लेखांमधील काही लेख हे अगदीच लहान म्हणजे एक-दोन ओळींचे आहेत तर काही लेख हे खूपच मोठे म्हणजे अगदी १०-११ ओळींचे सुद्धा आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर नाणेघाट तसेच पांडवलेण्यांतील शिलालेख. आता या लेखाचे स्वरूप कसे असते?- यातील काही लेख हे राजवंशीयांचे असतात तर काही लेख हे सामान्य लोकांचे असतात. राजघराण्यातील लोकांच्या लेखात सुरुवातीला ओम, स्वस्ति, नंतर राजाची स्तुती, पराक्रमाचे वर्णन आणि नंतर तो लेख कोरला जाण्याचे कारण हे नमूद केलेले असते. अर्थात हे सर्व ठिकाणी असेल असे नाही. सामान्य लोकांच्या लेखात, कधीतरी कालगणना, राजाचे नाव हे दिसून येते. पण मुख्यत्वे दिलेले दान आणि कुणी दिले हेच दिसून येते. 

कार्ले लेण्यांमधील शिलालेख 

      ब्राह्मी लिपी आणि तिच्या उगमाबद्दल बोलायचे झाले तर तो वेगळा विषय होईल त्यामुळे विस्तारभयास्तव या लिपीविषयी थोडक्यात जाणून घेउया.
        महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याचदा डोंगर भटकंती दरम्यान इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत असतो या पाऊल खुणा शोधत असताना आपल्या नजरेला बऱ्याच गोष्टी येत असतात जसे कि वीरगळ, गद्धेगाळ, कोरीव लेण्यांमध्ये असलेले महत्वाचे शिलालेख तसेच किल्यांवर आढळणारे शिलालेख हा सर्व ऐतिहासिक ठेवा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो.
      अश्याच एक ऐतिहासिक ठेवा म्हणजे 'ब्राम्ही लिपी' मधले शिलालेख हे शिलालेख आपल्याला बऱ्याचदा लेण्यांच्या भिंतीवर, लेण्याच्या टाक्यावर, लेण्याच्या विहारात किंवा खाबांवर कोरलेले आपल्याला मिळतात अश्या या ब्राम्ही लिपीच्या शिलालेखांमधून आपल्याला प्राचीन भारताची संस्कृती समजण्यास मदत होते किंवा त्या काळातील एखाद्या व्यक्तीचे नाव समजायला आपल्याला मदत होते.  ही ब्राम्ही लिपी वाचण्याचा शोध कसा लागला हे समजणे देखील खूप महत्वाचे आहे.
         एखाद्या लेण्यामध्ये तसेच जे कोणतेही आजच्या काळामध्ये ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेले लेख सापडतात ते वाचायचे कसे किंवा त्याचा अर्थ काय या गोष्टीचा शोध हा इ.स. १८३४ साली ईस्ट इंडिया कंपनी मध्ये धातू तपासनीस म्हणून काम करणाऱ्या 'जेम्स प्रिन्सेप' या इंग्लिश माणसाने सांगितले आहे. या ब्राम्ही लिपीचा इतिहास हा फार मजेशीर आहे.
        इ.स.पू. दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या प्रदेशावर ग्रीक राजे राज्य करीत होते या ग्रीक राजांनी स्वतःची स्वतंत्र नाणी पाडली होती. या ग्रीक कोरीव नाण्यांवर या ग्रीक राजांनी आपली नावे ही ग्रीक लिपी आणि ब्राम्ही लिपी मध्ये लिहिली होती 'बॅॅसिलीऑस पॅॅन्टॅॅलिऑन' या नावाबरोबर या राजाने आपले नाव 'रजने पतलवष' असे नाव ब्राम्ही लिपी मध्ये लिहिले होते हे नाण्यावरून आढळून आले आणि ब्राम्ही लिपी वाचता यायला लागली.


 

       या ब्राम्ही लिपीच्या वाचनाची उदाहरणे द्यायची झाली तर शाहबाज गढी येथील पियदसिच्या लेखामध्ये 'अंतियोक' म्हणजे सिरीयाचा 'दुसरा अँँन्टिओकस' आहे असे आढळून येते तसेच तुरमाय म्हणजे इजिप्त या देशाचा राजा 'टॉलेमी' हा असून 'अलीकसुंदर' हा इपिटरचा 'अॅॅलेक्झांडर' होय हे जेम्स प्रिन्सेप याने सांगितले आहे हे सर्व दुसऱ्या देशातील राजे भारतामधील महान 'सम्राट अशोक' याचे समकालीन होते.
     या ऐतिहासिक ब्राम्ही लिपीमधून एका अरेबिक लिपिशिवाय भारतामधील सगळ्या लिपी विकसित झाल्या आहेत म्हणूनच ब्राम्ही लिपी ही संपूर्ण लिपींंची जननी आहे असे आपल्याला दिसून येते. ब्राम्ही लिपीचा महत्वाचा जुना पुरावा म्हणजे 'सम्राट अशोकाचे' प्रस्तर लेख मानले जातात. यातला एक महत्वाचा प्रस्तरलेख हा महाराष्ट्रातील मुंबई जवळील सोपारा म्हणजेच आजचे 'नाला सोपारा' येथे आढळून आला हा महत्वाचा पुरावा मुंबई मध्ये राजा शिवछत्रपती संग्रहालय येथे ठेवलेला आहे.
          अशोकाने हा लेख सोपारा येथे कोरण्याचे कारण म्हणजे सोपारा हे अशोकाच्या काळापासून महत्वाचे बंदर होते हे दिसून येते. तसेच नाणेघाटाच्या गुहेमध्ये जे नागणिकेचे शिलालेख आहेत ते महाराष्ट्राच्या इतिहासातले ब्राम्ही लिपीच्या प्राचिनतेचा पुरावा देणारे पहिले शिलालेख मानले जातात. अशी ही ब्राम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संस्कृतीची महती करून देणारी जननी आहे. असा हा ब्राम्ही लिपीचा रंजक इतिहास आपल्याला ही महत्वपूर्ण ब्राम्ही लिपी समजून घेतल्यावर आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या प्राचीन इतिहासाशी नाळ जोडायला मदत होते.
तुमच्या माहितीसाठी म्हणून सोबत ब्राह्मी मधील अक्षरे कशी वाचावीत याचा एक जुजबी तक्ता देत आहे. अर्थात संपूर्ण भाषा येण्यासाठी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा तक्ता केवळ मदत म्हणून वापरता येईल.

        प्राचीन भारतातील एक बलाढ्य राजवंश असलेल्या सातवाहनांचा इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक  विश्वसनीय ठरतो. सातवाहन नाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांची नाणी ठरावीक भूभागांशी संबंधित आहेत. भौगोलिक कक्षेने मर्यादित आणि समकालीन नागरी वस्त्यांनी निर्देशित अशा प्रकारची चलनव्यवस्था या मौर्योत्तर कालखंडाचे एक वैशिष्ट्य मानायला हरकत नाही; किंबहुना हा नाणकशास्त्रीय परिणाम पूर्ण भारतभर दिसून येतो.
         नाण्यांच्या पुराव्यांवरून त्यांचा उदय इ. स. पू. १५० च्या सुमाराला दक्षिण विदर्भ आणि उत्तर तेलंगणात झाला, असे दिसते. मौर्योत्तर काळात प्राचीन ‘दक्षिणापथा’त अनेक लहान-लहान स्वतंत्र राजघराण्यांचा उदय झाला. त्यांपैकीच सातवाहन हे एक होते.  सातवाहन यायच्या आधी सुद्धा महाराष्ट्रात ठसा असलेली नाणी होती. पण सातवाहन राजांनी आपल्या नावाची नाणी पडली. या राजांची तांब्याची नाणी औरंगाबाद, हैद्राबाद वगैरे ठिकाणी सापडली आहेत तर शिशाची नाणी नेवासे, कोंडापूर या ठिकाणी सापडली आहेत. तसेच चांदीचा मुखवटा असणारी नाणी सुद्धा सापडली आहेत. यात प्रत्येक राजाचे नाणे वेगळे असे आहे. प्रत्येक राजाचा लेख वेगळा तसेच त्यावरील कोरलेल्या आकृत्या वेगळ्या.

सातवाहनकालीन नाणी-

       त्यांतील वासिष्ठीपुत्र सिमुक (श्रीमुख) नावाच्या राजाने पैठण-नेवासे (मराठवाडा) प्रांत व्यापून तेथून उत्तरेला नाशिक आणि दक्षिणेला वाई-कऱ्हाड या भागांत आपला अंमल बसवला आणि सातवाहन घराण्याच्या साम्राज्यवर्धनाला सुरुवात झाली. त्यांची सर्वांत प्राचीन नाणी नेवासे-पैठण भागाशी विवक्षित अशा ‘हत्ती’ प्रकारची आहेत. सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष ‘सातवाहन’ याच नावाचा राजा होता, असे मत काही नाण्यांच्या आधारे वा. वि. मिराशी यांनी मांडले होते; पण नाण्यांचा अभ्यास करता ‘सातवाहन’ असे नाव असणारी बरीच उत्तरकालीन नाणीही आता ज्ञात झाली आहेत. ती घराण्याच्या नावाला लेखात प्राधान्य देऊन काढली असावीत. दक्षिण भारतात सातवाहनांनी प्रथम राजनामांकित नाणी पाडण्यास आरंभ केला. ती तांबे, शिसे, पोटीन (potin) व काही प्रमाणात चांदीची नाणी होती. त्यांना ‘कार्षापणʼ ही संज्ञा असून नागनिकेच्या नाणेघाटातील लेखात विविध श्रौत यज्ञांत हजारो कार्षापणांची दाने दिल्याचा उल्लेख आहे. नाण्यांवरील लेख प्राकृत भाषेत असून ब्राह्मी व खरोष्ठी लिपीचा प्राधान्याने उपयोग केला आहे. सिमुक सातवाहन राजा- या राजाच्या नाण्यात उजवीकडे सोंड करून असलेला हत्ती दिसून येतो तर त्याच्या मागे सिरी सादवाह असा लेख कोरलेला आढळून येतो. तर काही नाण्यात उजवीकडे उभा असलेला वृषभ, त्याच्या पाठीवर तीन टेकड्यांचा पर्वत आणि त्याच्या सभोवताली ‘रञो सिरी सातवाहनस’ असा लेख दिसून येतो. या नाण्याच्या मागील बाजूस डावीकडे एक चिन्ह, उजवीकडे एक वृक्ष व टेकड्या व नदी कोरली दिसून येते. 
 
 
           सिमुकानंतर झालेला राजा सातकर्णी (सातकणी) याने सातवाहनांची साम्राज्यकक्षा पैठण-नाशिक-जुन्नर या महाराष्ट्रातल्या प्रांतांपासून विदर्भ आणि खानदेश, माळव्यातल्या नर्मदा आणि बेतवा या नद्यांच्या खोऱ्यांत असलेल्या नागरी वस्त्या तसेच जबलपूर-नजीकचे त्रिपुरी हे प्राचीन शहर येथपर्यंत वाढवली. या सर्व भूभागांतून सातकर्णीच्या नावाने पाडलेली अनेक विवक्षित प्रांतिक प्रकारांची नाणी ज्ञात आहेत. या नाण्यांवर हत्ती, सिंह, इत्यादी राजपददर्शक प्राणी, कुंपणातील झाड, नंदिपद, स्वस्तिक वगैरेंसारखी चिन्हे आणि सातवाहन घराण्याचे राजचिन्ह म्हणता येईल असे ‘चंद्रकोर-अंकित उज्जैन चिन्ह’ इत्यादी प्रकारविशेषांचा समावेश आहे. किंबहुना, सातकर्णीचा काल हा प्रकारशास्त्रीय ‘भौगोलिक विवक्षितते’चा कळसाध्याय म्हणायला हरकत नाही. सातकर्णी आणि त्याची पट्टराणी नागनिका या दोघांच्या संयुक्त नावाने पाडलेली नाणी हा प्राचीन भारतीय नाणकशास्त्रातला एक अनुपम प्रकारशास्त्रीय आविष्कार मानला जातो. ‘गजलक्ष्मी’ सारख्या दैवताचे चित्रणही सातकर्णीच्या नाण्यांवर दिसते. याच्या नाण्यावर ‘रञो सिरी सातकणिस’ किंवा ‘रञो सिरी-सातकंणि’  असा लेख कोरलेला दिसून येतो. सातकर्णीच्या कारकिर्दी अखेरीस सातवाहन साम्राज्य दोन किंवा तीन वेगवेगळ्या राजांच्या आधिपत्याखाली विभागले गेले, असे नाण्यांवरून दिसते. साति सिरी, जो सातकर्णीचा मुलगा होता आणि सिमुक हे साम्राज्याच्या पूर्व भागात राज्य करू लागले, असे त्यांची नाणी दर्शवतात. विदर्भ/उत्तर तेलंगण भागात राज्य करणारा सिमुक आणि सातवाहन घराण्याचा उद्गाता सिमुक हे दोन भिन्न राजे असल्याचे नाण्यांवरून स्पष्ट झाले आहे.
         सातकर्णीच्या उत्तर काळात त्याचे नाव सातवाहन घराण्यात उपनावाप्रमाणे वापरले जाऊ लागले. कोसिकीपुत्र सातकर्णी आणि कोछीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजांची माहिती मुख्यत्वे नाण्यांमुळे ज्ञात होते. या राजांचे राज्य फक्त महाराष्ट्राच्या काही भागांपुरतेच मर्यादित होते. या दोघांची नाणी हत्ती, सिंह, तीन कमानींचा पर्वत, इत्यादी चिन्हांनी मंडित आहेत. यानंतरच्या काळात सातवाहन घराण्याला उतरती कळा लागली आणि त्यांच्या महागामिक, महासेनापती, महाभोज इत्यादी मांडलिकांनी स्वतःची नाणी प्रचारात आणली.
       रोमानांशी व्यापार सुरू झाल्यानंतर त्यांच्या चांदीच्या नाण्यांच्या रूपाने भारतात व्यापार होऊ लागला. या सुमारास शक क्षत्रपांनी सातवाहनांवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. परिणामतः त्याचे पडसाद सातवाहन नाण्यांत उमटलेले दिसतात. शक राजा नहपान तसेच सातवाहन राजे शिव सातकर्णी आणि गौतमीपुत्र सिरी सातकर्णी यांनी एकमेकांची नाणी पुनर्मुद्रित केली. गौतमीपुत्र सातकर्णीने पुनर्मुद्रित केलेल्या नहपानाच्या नाण्यांचा एक मोठा साठा जोगळटेंभी (नाशिक जिल्हा) येथे सापडला (१९०७). गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला. त्याच्या कारकिर्दीपासून सातवाहन साम्राज्याची नव्याने वाढ झाली आणि त्यांच्या नाण्यांचे स्वरूपही बदलले.
 

डावीकडे तोंड करुन गर्जणारा सिंह भोवती ब्राह्मी लिपीतील मजकुर सिरी सातकर्णी त्याच्या खाली तीन कमानी ज्या टेकडीचे प्रतिनिधित्व करतात


वाशिष्ठीपुत्र सातकर्णी याचे नाणे
गौतमीपुत्र सातकर्णीने स्वतःची चिन्हे उमटविलेले नहपानाचे पुनर्मुद्रांकित नाणे. पुढची बाजू, मागची बाजू 
नागनिकेचे नाणे
श्री यज्ञ सातकर्णीचे नाणे
 गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदीचे नाणे


    गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यावर ‘रञो गोतमीपुतस सिरी सातकणिस’ असा कोरलेला लेख दिसतो तर वशिष्ठीपुत्र पुळूमावीच्या नाण्यावर ‘रञो वशिष्ठीपुतस सिवसिरी पुळूमावीस’ असा कोरलेला लेख वाचता येतो.
           गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र सिरी पुळुमावी (कार. इ. स. १०६-१३०) याने सर्वप्रथम स्वतःची छबी असणारी चांदीची नाणी प्रचलित केली. पुळुमावीच्या कारकिर्दीत सातवाहनांचा राज्यविस्तार दक्षिण आणि पूर्वेकडे झाला. या प्रांतात त्याने सिंह, तीन किंवा सहा कमानींचा पर्वत इत्यादी प्रकारांची नाणी काढली. याशिवाय पुळुमावीची साम्राज्यात सर्वत्र चालणारी ‘हत्ती’ प्रकारची नाणीही प्रचलित होती. साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेचे ‘नाणकीय केंद्रीकरण’ करण्याच्या दृष्टीने चांदीची छबीयुक्त नाणी आणि ही ‘हत्ती’ प्रकारची नाणी या दोन मूल्यांकांचे प्रचलन महत्त्वाचे ठरते.
        पुळुमावीनंतर त्याच्या अनेक वारसदारांनी छबीयुक्त नाणी पाडली. यात सिव सिरी पुळुमावी, सिरी सातकर्णी, खद (स्कंद) सातकर्णी आणि विजय सातकर्णी, तसेच यञ (यज्ञश्री) सातकर्णी यांचा समावेश होतो. उत्तरकालीन सातवाहन राजांचीही छ्बीयुक्त नाणी ज्ञात आहेत. यज्ञश्री सातकर्णीची जहाज, नौका छापाची नाणी विशेष उल्लेखनीय आहेत. सातवाहनांच्या नाविक संबंधांचे आणि सामर्थ्याचे सुस्पष्ट चित्रण या नाण्यांतून आढळते.
 स्कंद सातकर्णी- ‘सिरी खद सातकणिस’ असा लेख आहे, तर वशिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णी- ‘रञो वशिष्ठीपुतस सिरी खद (सातकणिस)’  असा लेख दिसतो,  यज्ञ सातकर्णी- ‘रञो सिरी यञ [सातकणिस] असा लेख आहे, तसेच  विजय सातकर्णी- ‘[ज] य सातकणिस’ हा लेख.
आणि  वशिष्ठीपुत्र चंद्रस्वाती- ‘रञो वासिठीपुतस सिरीचदसातिस’ असा लेख वाचता येतो.
 
 
 सोंड उंचावलेल्या या हत्तीच्या ठशाच्या नाण्यावर पुढील बाजुवर असलेला लेख श्री कुभ सातक ( नीसा )  तर ,मागच्या बाजुला चार वर्तुळांचा उज्जैनचा ठसा
 
      बहुतेक सातवाहन नाण्यांवर लेख आढळतात. ते माहाराष्ट्री प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेले आहेत. लेखांची सुरुवात राजपददर्शक ‘रञो’ शब्दाने होते आणि ते षष्ठी विभक्ती-रूपात, म्हणजेच नाणे कोणा‘चे’ आहे, ते दर्शवतात. चांदीच्या छबीयुक्त नाण्यांवर माहाराष्ट्री आणि दक्षिणी अशा दोन प्राकृत भाषांतील लेख आढळतात. प्रदेशपरत्वे तेथील परिचित लिपीत त्यांवर लेख कोरले आहेत.
      सातवाहन नाणी ही मुख्यत्वे ठशांचा वापर करून बनवली असली तरी प्रारंभीच्या काळातील आहत नाणीही ज्ञात आहेत. बहुतेक नाणी मिश्र धातू स्वरूपात असून तांबे, शिसे, जस्त इत्यादी धातूंना प्राधान्य होते. आंध्र-कर्नाटकातील नाण्यांत शिशाच्या नाण्यांची बहुलता आढळते. सातवाहन राजांची कालनिश्चिती, त्यांचा साम्राज्यविस्तार, धार्मिक धोरण, वित्तीय बदल आणि त्यांचा व्यापार-उदीम इत्यादी बाबींवर त्यांची नाणी प्रकाश टाकतात. राजांच्या नावांमुळे, राजघराण्यांच्या नावांमुळे किंवा अक्षरांच्या/लिपीच्या शैलीवरून लेखाचा/ नाण्याचा काळ ठरवला जातो.
     महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या वाटेगाव येथील प्रसिद्ध प्राचीन नाणेसंचय. येथील एका जमिनीमध्ये रोपे लावताना काही मुलांना हा नाणेसंचय सापडला (ऑगस्ट १९६१). या संचामध्ये एकूण ६८४ सातवाहनकालीन नाणी होती. या नाण्यांचे संशोधन व प्रकाशन प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी (१८९३—१९८५) यांनी प्रथम केले.
      संचयातील ६८४ नाण्यांपैकी ६८२ नाणी शिसे या धातूची तर दोन तांब्याची  होती. १९३९ साली सापडलेल्या सातवाहनांच्या तऱ्हाळे नाणेसंचयानंतर (१६०० नाणी) महाराष्ट्रात सापडलेला हा सर्वांत मोठा नाणेसंचय आहे.  नाणेसंचयातील  सर्व नाणी गोलाकार आहेत.
 जोगळटेंभी येथील सातवाहनकालीन नाणी :-
       या नाणेसंचयातील नाण्यांवर​ प्रथमच ​शिवश्री पुळुमावी​ व ​स्कंद सातकर्णी​ या ​सातवाहन नृप​तींचा  मातृकुलवाचक उल्लेख असणारा मोठा लेख ​आढळून आला. तसेच ​या नाण्यांमुळे ​सातवाहनांच्या उत्तर कालखंडात त्यांच्या आधिपत्याखाली हा भाग असल्याचे कळ​ले.
जोगळटेंभी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील प्रसिद्ध नाणी. १९०८ मध्ये पश्चिमी क्षत्रप राजवंशातील क्षहरात घराण्यातील नहपान राजाच्या चांदीच्या नाण्यांचा मोठा संचय येथे सापडला. या संचातील १३,२५० एवढ्या नाण्यांची अधिकृत नोंद आढळत असली, तरी प्रत्यक्षात या नाण्यांची संख्या १४,००० ते १५,००० असावी, असे नोंदवले आहे. हा नाणेसंचय प्रथम रेव्ह. एच. आर. स्कॉट यांनी प्रसिद्ध केला (१९०८).

जोगळटेंभी येथील नहपानाचे नाणे.

        नाणेसंचयाचे स्वरूप : या संचयात सापडलेल्या १३,२५० नाण्यांपैकी ९,२७० नाणी ही नहपानाचा समकालीन सातवाहन कुळातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने आपल्या स्वतःच्या  चिन्हांनी पुनर्मुद्रांकित (counter-struck) केलेली होती. गौतमीपुत्र  सातकर्णी  हा नहपानाचा  शत्रू होता. त्याचा नहपानाबरोबर दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. या संघर्षाचे पर्यवसान गौतमीपुत्राने नहपानाचा व पर्यायाने त्याच्या क्षहरात वंशाचा  उच्छेद करण्यात झाले, असे उल्लेख  तत्कालीन अभिलेखीय व साहित्यिक नोंदींमध्ये आढळतात. उर्वरित जवळपास ४,००० नाण्यांवर मात्र अशा प्रकारचे गौतमीपुत्र सातकर्णीचे अंकन आढळत नाही. प्राप्त साठ्यापैकी एकूण २,००० नाण्यांना भोके पाडली आहेत.
      नाण्यांचे वर्णन : प्राप्त सर्व नाणी चांदीची असून १.८० ते २.१० ग्रॅ. वजनाची आहेत. फक्त नहपानाचे अंकन असलेल्या नाण्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : नाण्यांच्या दर्शनी भागावर राजाची टोपी घातलेली अर्धप्रतिमा आहे. राजाच्या प्रतिमांमध्ये वैविध्य आढळत असून राजाच्या तारुण्यापासून ते वृद्धत्वापर्यंत वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरील प्रतिमा नाण्यांवर आढळतात. प्रतिमांचे अंकन वास्तवदर्शी व कौशल्यपूर्ण आहे. दर्शनी भागावरील गोलाकार कडेवर ग्रीको-रोमन लिपीतील लेख आहे. हा लेख म्हणजे नाण्याच्या मागील बाजूवरील ब्राह्मी व खरोष्ठी लिपीतील लेखांचे लिप्यंतर आहे. बऱ्याच नाण्यांवरील ग्रीको-रोमन लिपीतील लेख अशुद्ध रूपातील आहे. नाण्यांच्या मागील बाजूस नहपानाचा पूर्वज असलेल्या भूमकाच्या नाण्यांवर दर्शनी बाजूवर आढळणारी वज्र व बाण ही चिन्हे आहेत. वज्र व बाणाच्या मध्ये टिंब आहे. मागील बाजूच्या  गोलाकार कडेवर ब्राह्मी लिपीतील ‘राज्ञो क्षहरातस नहपानसʼ हा व खरोष्ठी लिपीतील ‘राञो छहरतस नहपनसʼ असे लेख आहेत. नाण्यांवर वर्षाचा उल्लेख आढळत नाही.
         गौतमीपुत्र सातकर्णीने  पुन्हा अंकन केलेल्या नाण्यांचे वर्णन : नहपानाच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने आपले छाप मारलेले आढळतात. यामध्ये सामान्यतः दर्शनी बाजूवर चैत्य व गोलाकार कडेवर ‘राञो गोतमीपुतस सिरि सातकनिसʼ हा ब्राह्मी लिपीतील लेख आढळतो. तर मागील बाजूस उज्जैन चिन्ह आहे.  तथापि काही वेळा पुढील व मागील बाजूंवरील चिन्हांची अदलाबदल झालेली दिसून येते. गौतमीपुत्राने केलेले अंकन ठसठशीत स्वरूपाचे असल्यामुळे त्यावरील चिन्हांची वैशिष्ट्ये ओळखणे शक्य होते. चैत्य व उज्जैन चिन्हांमध्ये आढळणारी वैविध्ये बघता वेगवेगळे छाप वापरल्याचे लक्षात येते. तसेच काही नाण्यांवरील लेख सुस्पष्ट व नीटनेटके असून काहींवरील अक्षरे मोठी, वेडीवाकडी व अस्पष्ट असल्याचे दिसून येते. वर्षाचा उल्लेख आढळत नाही.
       नाणेसंचयाचे महत्त्व : नहपानाच्या काही फुटकळ नाण्यांच्या प्राप्तीनंतर प्रथमच एवढा मोठा नाणेसमुच्चय नाणेसंशोधकांना अभ्यासासाठी प्राप्त झाला. या उपलब्धीमुळे तत्कालीन नाणेपद्धतीवर तर प्रकाश पडतोच; पण त्याचबरोबर पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजवंशाच्या राजकीय इतिहासावरही प्रकाश पडतो. पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजांच्या परस्परसंबंधाचे विश्लेषण याद्वारे करणे शक्य होते. विशेषतः गोदावरी खोऱ्यातील या दोन राजवंशांचा संघर्ष अधोरेखित होतो.  याबरोबरच तत्कालीन सांस्कृतिक व आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठीही या नाणेसंचयाची मदत होते. या नाण्यांवरून नहपानाच्या राज्याची भौगोलिक सीमा ठरवता येते. त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा उच्छेद केल्यानंतरही त्याची नाणी पुन्हा अंकन करून चलनात आणल्याचे कळते. थोडक्यात तत्कालीन इतिहासाचे साधन म्हणून या नाणेसंचयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
चंद्रपूर येथील सातवाहनकालीन नाणी :-
          ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला (ऑक्टोबर १८८८). ब्रिटिश पोलीस उपअधीक्षक जे. हिगीन्स यांनी सापडलेला हा संचय एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेकडे सुपुर्द केला. या नाणेसंचयाचा अहवाल प्रथम डॉ. हॉर्नले यांनी प्रोसिडिंग्ज ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमध्ये प्रसिद्ध केला (१८९३). या नाणेसंचामध्ये एकूण १८३ नाण्यांचा समावेश होता. संचयातील सर्व नाणी सातवाहन नृपतींची होती.  या संचयाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भात सापडलेला सातवाहन नाण्यांचा हा प्रथम संचय होय.
      नाण्यांचे वर्णन : या निधीतील सर्व नाणी पोटीनची (तांबे व शिसे यांचा मिश्र धातू) आहेत. दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती, तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह या प्रकारची ही नाणी आहेत. यांच्या  दर्शनी भागावर गोलाकार कडेवर राजाचे नाव असणारा प्राकृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ही नाणी साधारणपणे ३०-५० ग्रेन्स वजनाची आहेत.
      एकूण १८३ नाण्यांपैकी हॉर्नले यांनी ५१ नाणी गौतमीपुत्र सातकर्णी, २४ नाणी वासिष्ठीपुत्र पुळुमावी, तर ४२ नाणी यज्ञ सातकर्णी यांची असल्याचे दर्शविले आहे. हॉर्नले यांच्या नोंदींप्रमाणे गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यांवर सिरि सातकरणि  (सदर वाचन प्राकृत भाषेच्या नियमाना धरून नाही, हे आधुनिक काळातील सातवाहन नाण्यांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.) अथवा सिरि सातकणिस हे लेख आढळले. वासिष्ठिपुत्र पुळुमावीच्या नाण्यांवर (सि) अथवा सिरि पुळुमाविस अशा प्रकारचे लेख आढळले. पुळुमावीच्या काही नाण्यांवर सिरि (श्री) हा बहुमानदर्शक शब्द न आढळता केवळ पुळुमाविस असाही लेख आढळला आहे (ही नाणी त्रुटित लेखांची असल्याने त्यावर फक्त पुळूमावीस एवढाच लेख दिसतो). यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवर *ञ सीरि यञ सातकणि  (* = पहिले अक्षर वाचता येत नाही) असा लेख दिसून येतो. याशिवाय काही नाण्यांवर अनिश्चित स्वरूपाचे लेख आढळले. यांपैकी एका नाण्यावर य (गद?) सात, दोन नाण्यांवर सिरि (किंवा रि )कणु सात (ही नाणी बहुदा कर्ण सातकर्णीची असावीत, असे नंतर सापडलेल्या  पुराव्यांवरून विशेषतः तऱ्हाळे नाणे संचयात प्राप्त झालेल्या नाण्यांवरून  वाटते.) आणि उर्वरित दोन नाण्यांवर फक्तरञो  (किंवा ञ्ओ) अशा प्रकारचे लेख आहेत. हॉर्नले यांना या नाण्यांची ओळख पटवता आलेली नाही.​ मुळात चांदा नाणेसंचय हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात सापडला असून त्या काळी सातवाहन नाण्यांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धी झाली नव्हती, तसेच सातवाहन नाण्यांबद्दलची माहिती अपूर्ण होती. या मर्यादा लक्षात घेऊन चांदा नाणेसंचयाचा अभ्यास करावा लागेल. वरील नाणेनिधीतील काही नाणी ब्रिटिश म्युझिअम, लं​​डन, काही नाणी इंडियन म्युझिअम, कोलकाता येथे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय ६० नाणी किंवा नाण्यांचे तुकडे सापडले आहेत. त्यांच्या दर्शनी भागावरील हत्तीचे चिन्ह व मागील बाजूवरील उज्जैन चिन्ह स्पष्ट दिसत असले, तरी लेख संपूर्णपणे नष्ट झाले आहेत.
       नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी हा वर सांगितल्याप्रमाणे विदर्भात सापडलेला पहिला नाणेसंचय आहे. यानंतर इतर नाणेसंचय सापडले असले, तरी सातवाहनकालीन नाण्यांचा तपशीलवार अभ्यास करणे या नाणेनिधीमुळे शक्य झाले. सातवाहनकालीन विशेषतः उत्तर सातवाहकालीन नाण्यांचा संचय यादृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे. सातवाहनांच्या नाण्यांची व्याप्ती व प्रसार खूप विस्तृत आहे. सातवाहन नृपतींनी   त्यांच्या आधिपत्याखालील विविध प्रदेशांमध्ये  वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली. त्यामुळे सातवाहनकालीन नाण्यांचा अभ्यास करताना तो कालक्रमानुसार तसेच प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार करणे सयुक्तिक ठरते. त्यांपैकी विदर्भात उत्तर सातवाहन काळात हत्ती व उज्जैन चिन्ह असलेली नाणी दीर्घकाळ प्रचलित असल्याचे कळते. सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे राज्य फक्त महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा भागापुरते मर्यादित असल्याचे चांदा व तऱ्हाळे नाणेसंचयावरून दिसून येते. सातवाहनांच्या हत्ती व उज्जैन छापाची नाणी तांबे, शिसे व पोटीन या धातूंमध्ये आढळतात. त्यांपैकी चांदा येथे केवळ पोटीनची नाणी आढळली आहेत. मूलतः या नाण्यांची व्याप्ती मोठी असली, तरी सातवाहनांच्या शेवटच्या काळात ती केवळ विदर्भात आढळतात. त्यामुळे उत्तर सातवाहनकालीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने चांदा नाणेसंचय महत्त्वाचा ठरतो.
          वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात)  स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय प्राप्त झाला. तत्कालीन ट्रेजर ट्रॉव्ह ॲक्ट अंतर्गत त्या काळातील प्रांतिक सरकारने सदर निधी ताब्यात घेतला व मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर यांच्याकडे पाठविला.
तऱ्हाळे येथील सातवाहनकालीन नाणी :-
        विदर्भामध्ये सापडलेला सातवाहनकालीन नाण्यांचा हा दुसरा महत्त्वाचा नाणेसंचय आहे. तऱ्हाळे नाणेसंचयाचे संशोधन व प्रकाशन सर्वप्रथम वा. वि. मिराशी यांनी केले.
      नाणेसंचयाचे वर्णन : नाणेसंचयातील १६०० नाण्यांपैकी १५२५ नाणी पूर्ण आकाराची तर, ७५ नाण्यांचे तुकडे आढळून आले. सर्व नाणी केवळ सातवाहन नृपतींची होती. परदेशी राजवंशाचे (उदा., रोमन) एकही नाणे नव्हते, हे या नाणेसंचयाचे वैशिष्ट्य. प्राप्त नाणी पोटीन या मिश्र धातूची (तांबे व शिसे या धातूंचे मिश्रण) होती.  तथापि निरनिराळ्या नाण्यांमध्ये तांबे व शिसे यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे आढळून आले. काही नाणी शिसे या धातुप्रमाणे काळी तर काही तांब्याप्रमाणे तांबड्या चकचकीत रंगाची असल्याचे दिसून आले.
         नाण्यांचे वर्णन : संचयातील सर्व नाणी एकाच प्रकारची व गोलाकार आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेला हत्ती व गोलाकार कडेवर व ब्राह्मी लिपीत व  प्राकृत भाषेत राजाचे नाव सांगणारा लेख तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. उज्जैन चिन्हाच्या चार बाजूंवरील मोठ्या वर्तुळांमध्ये एक लहान वर्तुळ (वर्तुळात वर्तुळ) आहे. काही वर्तुळांच्या वरच्या बाजूला चंद्रकोर आहे.
      कर्ण सातकर्णी या राजाची नाणी वगळता उर्वरित नाण्यांवर दर्शनी भागावरील हत्तीचे तोंड उजवीकडे आहे. कर्ण सातकर्णीच्या नाण्यांवर मात्र हत्तीचे तोंड डावीकडे आहे, असे निरीक्षण मिराशींनी नोंदविले आहे. काही नाण्यांची चकती (planchet) लेखाच्या ठशापेक्षा लहान असल्यामुळे बऱ्याच नाण्यांवर लेख अपूर्णावस्थेत आहेत. नाणी वजनाने हलकी असून वजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. प्राप्त नाण्यांचे नृपतीनिहाय वर्णन पुढीलप्रमाणे :
          गौतमीपुत्र सातकर्णी : नाण्यांची संख्या –  ५७३. निधीतील सर्वाधिक नाणी या नृपतीची आढळतात. नाण्यांवर सिरि सातकणिस  किंवा  सिरि  सातकणि  हे लेख आढळतात. नाण्यांचे वजन – ३१- ६० ग्रेन्स दरम्यान.
वाशिष्ठिपुत्र पुळुमावी : नाण्यांची संख्या – १७४. नाण्यांवर रञो सिरि पुळुमाविस  अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ४५  ग्रेन्स दरम्यान.
          चौथा सातकर्णी : नाण्यांची संख्या – ३५. नाण्यांवर सिव सिरी सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : २६ – ३८ ग्रेन्स दरम्यान.
         शिवश्री पुळुमावी : नाण्यांची संख्या – ३२. नाण्यांवररञो सिव सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३७ – ५० ग्रेन्स दरम्यान.
           स्कंद सातकर्णी :  नाण्यांची संख्या – २३. नाण्यांवर (रञो) सिरि खद सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ५० – ५२ ग्रेन्स दरम्यान.
          यज्ञ सातकर्णी : नाण्यांची संख्या २४८. नाण्यांवर रञो सिरि यञ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३१ – ४५ ग्रेन्स दरम्यान.
          विजय सातकर्णी : नाण्यांची संख्या : ४. नाण्यांवर (सिरि) विजय सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ५० ग्रेन्स दरम्यान.
         कुंभ सातकर्णी : नाण्यांची संख्या : ५६. नाण्यांवर  (रञो) सिरि कुभ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : सरासरी ३० ग्रेन्स.
          कर्ण सातकर्णी : नाण्यांची संख्या – ७. नाण्यांवर  सिरि कण सातकणिस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ३० – ३६ ग्रेन्स दरम्यान.
          शक सातकर्णी : नाण्यांची संख्या –  ४. नाण्यांवर सिरि सक किंवा सकस सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ३४ – ३७ ग्रेन्स दरम्यान.
श्री पुळुहामवी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर (रञो सिरि) पुळुहामविस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ४० – ५१ ग्रेन्स दरम्यान.
याशिवाय ज्या नाण्यांवरचे लेख वाचता येत नाहीत, अशा नाण्यांची संख्या ३६५ एवढी आहे.
      नाणेसंचयाचे महत्त्व :  चांदा नाणेनिधी प्रमाणेच नंतरच्या काळात सापडलेला  तऱ्हाळे नाणेसंचय सातवाहनांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा स्रोत ठरतो. आतापर्यंत सापडलेल्या सातवाहनकालीन नाणेसंचयामध्ये हा नाणेसंचय मोठा आहे. उत्तर सातवाहन काळातील सातवाहन नृपती व त्यांचा कालक्रम ठरविण्यासाठी या नाणेसंचयाची मदत होते. हत्ती व उज्जैन छापाची नाणी विदर्भात चलनात होती, हे या संचयामुळे सिद्ध होते. पुराणात वर्णन केलेल्या अनेक सातवाहन राजांची नाणी प्रथमच या नाणेसंचयाद्वारे प्राप्त झाली.  तसेच पुराणात उल्लेख नसलेल्या काही राजांची नाणीदेखील या संचयामुळे प्रकाशात आली. सातवाहन राजवंशाच्या अगदी शेवटच्या काळात सातवाहनांची सत्ता विदर्भापुरती मर्यादित असल्याचे पुरावे या नाणेनिधीमुळे प्राप्त झाले.

तांब्याची नाणी : नाणेसंचयात तांब्याची केवळ दोन नाणी सापडली आहेत.  ती दुसऱ्या ठिकाणाहून आली असावीत. यांपैकी एक नाणे गंजलेले आहे. त्याच्या दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती असून त्याच्या पाठीवर तक असा लेखाचा तुटक भाग दिसतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. हे नाणे बहुधा सातकर्णी नावाने शेवट होत असलेल्या सातवाहन राजाचे असावे. दुसरे नाणे तुटलेल्या अवस्थेत आढळले.
शिशाची नाणी : शिशाच्या ६८२ नाण्यांपैकी ३६९ नाणी वाशिष्ठीपुत्र शिव श्री पुळुमावी, १९१ नाणी वासिष्ठीपुत्र स्कंद सातकर्णीची, तर उर्वरित १२२ नाण्यांवरचे लेख अतिशय अस्पष्ट असून ओळखता येत नाहीत.
​शिवश्री पुळुमावीची नाणी : मिराशी यांच्या मते, शिवश्री पुळुमावी व वाशिष्ठिपुत्र पुळुमावी हे दोन भिन्न राजे नसून एकच आहेत; तथापि​ या बाबतीत दोन विभिन्न मतप्रवाह आढळतात व त्याप्रमाणे ​ इतर नाणेसंशोधक व तज्ज्ञांच्या मते हे दोन  भिन्न राजे होते. नाण्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा असून नाण्याच्या गोलाकार कडेवर रञो वासिष्ठीपुतस सिव- सिरी- पुळुमाविस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्याच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून काही वेळा उज्जैन चिन्हांच्या वर्तुळांवर चंद्रकोर आढळते. नाण्यांच्या आकारामध्ये व वजनांमध्ये वैविध्य आढळते.
​​स्कंद सातकर्णीची नाणी : स्कंद सातकर्णीच्या नाण्यांवर दर्शनी भागावर सोंड उंचावलेल्या हत्तीची प्रतिमा व  रञो वसिठी- पुतस खद- सातकणिस हा ब्राह्मी लिपीतील व प्राकृत भाषेतील लेख आढळतो. नाण्यांच्या मागील बाजूवर उज्जैन चिन्ह असून त्यावरील वर्तुळांवर काही वेळा चंद्रकोर दिसून येते.

गौतमीपुत्र सातकर्णी (शतकर्णी) नाणी

 सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले याच्या कार्यकाळात सातवाहन राज्याने भरभराटीचा कळस गाठला होता.
        नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.
एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात
उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा.
         बोरीवली येथील कान्हेरी लेणी हि सुद्धा याच सातवाहनाची देण आहे शकांचे दमन करणारा  सातवाहन गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.
गौतमीपुत्र सातकर्णी याचे नाणे
 
सातकर्णी राजाचे नाणे- साभार गुगल (सिरी) सातकणी(स) तसेच उजवीकडे सोंड असलेला हत्ती सुद्धा कोरलेला दिसून येतो
वजन- २.४८ gram

गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदिचे नाणे

त्या नाण्याची पाठची बाजु.
 सातकर्णी तांब्याची नाणी
 
      दक्षिणेचेपहिले सम्राट सातवाहन यांची नाणी महाराष्ट्रात नाशिक, नेवासे , कोल्हापूर, तेर, कऱ्हाड, पैठण,जुन्नर, चांदा व तऱ्हाळे इ. अनेक ठिकाणी सापडली आहेत. सातवाहनानी मुख्यत्वे तांब, जस्त इत्यादी धातूंचा उपयोग केला असून, चांदीचा वापर वसिष्ठीपुत्र पुलुमावी , वसिष्ठीपुत्र सातकर्णी व गौतमीपुत्र श्री यज्ञ सातकर्णी चित्रीत केलेली थोडी नाणी सापडली आहेत. सातवाहन नाण्यांवर बैल, हत्ती व सिंह यासारख्या प्राण्यांच्या कोरलेल्या अक्षरांसहित आकृती एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला साधारणतः पार बांधलेले झाड, मासा, वृषभ, नदी, नंदीपद व उज्जैन पद्धतीचे स्वस्तिक या प्रकारची चित्रे आहेत.      

 गाथा सप्तशती :-

        तिसरे महत्वाचे साधन ठरते ते हल नावाच्या सातवाहन राजाने संपूर्ण भारतातून सुमारे एक कोटी गाथा गोळा करून सुमारे सातशे गाथांचा गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला. खालील श्लोकातून हे स्पष्ट होते.
सत्तसआइं कइवच्छेलेण कोडीअ मज्झआरम्मि।
हालणे विरइआइं सालंकारणं गहाणं॥
बाणाने आपल्या ‘हर्षचरित’ च्या सुरुवातीला या गाथेची स्तुती केली आहे. तो म्हणतो,
अविनाशनमग्राम्यकरोत् सातवाहनः ।
विशुद्धजातिभी: कोश रत्नैरीव सुभाषितैः ॥
        गाथासप्तशती हा ग्रंथ म्हणजे अनेक गाथांचे संपादन आहे. यात विविध राजांच्या पदरी कवींच्या गाथा आहेत तसेच अनेक लेखकांनी लिहिलेल्या गाथा आहे. या गाथांचा अभ्यास करताना तत्कालीन समाजजीवन कसे होते याची उत्तम माहिती मिळते. बहुतांश गाथा या प्रेमगीत स्वरूपाच्या आहेत परंतु एकंदर कुटुंबव्यवस्था कशी होती याचा अभ्यास करताना हा ग्रंथ महत्वाचा ठरतो. श्री. सदाशिव जोगळेकर यांनी या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून तो प्रथम प्रकाशित केला तो ‘गाथा सप्तशती’ या नावानेच. या गाथासप्तशतीचा सविस्तर आढावा आपण पुढे घेणार आहोत.

पुराणे-

       याशिवाय नंतरच्या काळात लिहिलेल्या विविध पुराणात सुद्धा सातवाहन राजांचा उल्लेख आला. मागच्या लेखात आपण संख्येत कशी विसंगती होती ते पाहिलंच. अर्थात ही सर्व पुराणे नंतरच्या काळात असल्याने त्यात बदल होत गेले आणि त्यांचे प्राथमिक संदर्भाचे महत्व तितकेसे राहिले नाही. परंतु शिलालेख, नाणी यांच्या जोडीला अभ्यास म्हणून मत्स्य, भागवत, विष्णू या सर्व पुराणांचा अभ्यास जरूर करावा.
         तर ही होती ‘सातवाहनांच्या इतिहासाची साधने’. मध्ययुगीन काळातील इतिहास जसा सहज आढळतो तशी सातवाहन कालीन साधने आढळत नाहीत. ती खूप कष्ट घेऊन शोधावी लागतात, प्रत्येक साधनांचे अन्वयार्थ लावून नीट मांडणी करावी लागते. तेव्हा कुठे सातवाहन कळायला लागतात.

नाणेघाट

        महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ. ते पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर जुन्नर तालुक्यात जुन्नरच्या वायव्येस सुमारे २८ किमी.वर वसलेले आहे. हा घाट सुमारे ५ किमी. लांब व ८६० मी. उंच आहे. प्राचीन काळी पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईच्या उत्तरेस असलेल्या भडोच (भरुकच्छ), सोपारा (शूर्पारक), तसेच दक्षिणेकडील कल्याण व चेऊल (चौल) या बंदरांत येत असे. या बंदरांपैकी सोपारा येथे येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीमार्गे देशावर होत असे, तसेच यात्रेकरू देशावरून कोकणात ये-जा करीत असत. सोपारा व कल्याण येथून देशावर येण्यास नाणेघाट हा अगदी जवळचा मार्ग होता. नाणेघाटापासून पुढे हा मार्ग देशावर जुन्नर-नगर-नेवासा-पैठण असा जातो. त्यामुळे नाणेघाट कोकण व देश यांस जोडणारा दुवा आहे. घाटमाथ्यावर पठार असून तेथे एक भव्य कोरीव दगडी रांजण आहे. या रांजणात पूर्वी जकातीची रक्कम जमा केली जात असल्याची शक्यता वर्तविली जाते. मात्र त्यात काहीही तथ्य माही. हा राजंण पाण्यासाठी होता. नाणेघाटाचे भू-राजकीय स्थान आणि त्याचा शेजारील जुन्नर या प्राचीन स्थानाशी असलेला निकटचा संबंध बघता,  प्राचीन काळातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून जुन्नरचे अस्तित्व दिसून येते. क्लॉडियस् टॉलेमी सुद्धा इथे येऊन गेला आहे. त्याने ह्या नाणेघाटाचे वर्णन 'एका वाहत्या नदी इतकी वाहतूक असलेला' असं केलं आहे.
            ह्या घाटाबद्दल एक कथा अशी सांगतात की परदेशी व्यापार्यांसाठी सातवाहन राजांना एक 'हमरस्ता' बांधायचा होता, तेंव्हा त्यांनी फर्मान काढलं की जो माणूस लवकरात लवकर प्रशस्त घाट बांधेल त्याला राजा बक्षीस देईल. दोन 'बांधकाम कंत्राटदार' स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले - एकाचं नाव होतं 'नाना' आणि दुसरा 'गुणा'. नानाने बांधलेला घाट आधी पूर्ण झाला - तो नाणेघाट, आणि गुणाचा घाट अर्धवट राहिला कारण सरकारी बक्षीस नानाला मिळाले. हा 'गुणाघाट' जीवधन किल्ल्याच्या दक्षिणेला येतो.

 

नाणेघाट

नाणेघाट येथे, खिंडमार्गात, मुख्य लेण्यात सातवाहन वंशातील राजांचे व त्यांच्या नातेवाइकांच्या भग्न झालेल्या प्रतिमांचे अवशेष असून त्या प्रतिमांच्या वरील बाजूंस त्यांची नावे कोरलेली आहेत. येथील सातवाहन राणी नागनिका हिने केलेल्या वैदिक यज्ञांचा व दानांचा प्रदीर्घ शिलालेख दोन भिंतींवर कोरला आहे. त्यातील बरीचशी अक्षरे नष्ट झाली असली, तरी त्यातील अवशिष्ट मजकुरावरून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीवर बराच प्रकाश पडतो. येथील मुख्य लेण्याच्या मंडपात दोन बाजूंस बाके कोरलेली असून मंडपाच्या डाव्या आणि उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. मागील भिंतीत सातवाहन राजवंशातील सात व्यक्तींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत त्या अशा : सिमुक सातवाहन, देवी नागनिका, श्रीसातकर्णी, कुमार भाय, महारठी त्रनकयिर, कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन. यांपैकी एका जोडपुतळ्याच्या वरच्या बाजूस देवी नागनिका आणि श्रीसातकर्णी असा लेख आहे. त्यावरून ती सातकर्णीची राणी असावी, तसेच महारठी त्रनकयिर हा नागनिकेचा पिता असावा, असे वा. वि. मिराशी म्हणतात. तर शेवटचे दोन अनुक्रमे कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन हे सातकर्णी व नागनिकाचे लहान पुत्र होते आणि हे लेणे सातवाहन राजवंशाचे प्रतिमागृह असावे, असे पुरातत्त्ववेत्त्यांचे मत आहे.


नाणेघाट येथील शिलालेख.

          नाणेघाट लेण्यात कोरलेला नागनिकेचा वर उल्लेखिलेला शिलालेख ब्राह्मी लिपीत असून प्राकृत भाषेत आहे. शिलालेखाच्या अक्षरवटिकेवरून या शिलालेखाचा काळ योहान ब्यूलर, मिराशी यांसारख्या पुराभिलेखविद्यावंतांच्या मते साधारणतः इ.स.पू. दुसरे-पहिले शतक असावा. या शिलालेखाचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व सर्वांत प्रथम उजेडात आणलं साइक्स यांनी. वर्ष १८३३ मध्ये मुंबईत असणाऱ्या ‘Bombay Literary Society’ मध्ये त्यांनी या शिलालेखाविषयीचा आपला शोधनिबंध सादर केला. खरंतर त्यांना हा शिलालेख पूर्णपणानं अनुवादित करता आला नव्हता.
       पुढं, सन १८३७ साली साइक्स यांनी जॉन माल्कम यांच्यासोबत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये 'Inscription from Boodh caves near Joonar' या सदराखाली शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामुळं जेम्स प्रिन्सेप याचं लक्ष नाणेघाटकडं वळालं. साइक्स यांनी काही अक्षरांचा छाप घेतला होता, तो प्रिन्सेप यांना पाठवून दिला. तेव्हा लक्षात आलं, की हा शिलालेख ब्राह्मी लिपीत कोरण्यात आला आहे.
       पुढं, वर्ष १८८३ मध्ये जेव्हा जेम्स बर्गेस यांनी ‘Report on the Elura cave temple and Bramhanical & Jain caves’ हा अहवाल प्रकाशित केला, तेव्हा त्यामध्ये जॉर्ज बुल्हर यांनी पहिल्यांदाच संपूर्ण शिलालेखाचं वर्णन केलं. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही लेणी एका राजघराण्यातील व्यक्तीनं तयार केली असल्याचं मत त्यांनीच सर्वप्रथम लिखित स्वरूपात मांडलं. ''पश्चिम भारतातील सर्वांत महत्त्वाचा लेख'' या शब्दात नाणेघाटाच्या शिलालेखाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. पुढे   रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन, भगवानलाल इंद्रजी, ब्यूलर, मिराशी, अजयमित्र शास्त्री, शोभना गोखले प्रभृतींनी या शिलालेखाचे वाचन करून अन्वयार्थ लावले आहेत.
         हा लेख केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर दख्खनमधील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारा अतिशय महत्त्वाचा पुरातत्त्वीय साधन म्हणून सुद्धा महत्त्वाचा आहे. लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवर दहा तसेच उजव्या बाजूच्या भिंतीवर दहा ओळी कोरण्यात आल्या आहेत. मधल्या बाजूला सातवाहन राजवंशातील नऊ महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे उभारले होते आणि त्यांची ओळख करून देण्यासाठी शिलालेखात माहितीसुद्धा देण्यात आली होती.
       हा लेख कोरण्यासाठी कारणीभूत असलेल्या सम्राज्ञी नागणिका राणीचा उल्लेख शिलालेखात 'नाग वरदायिनी', 'मासोपवासिनी', 'गृहतापसी', 'चरित ब्रह्मचर्या' या गौरवपर शब्दांनी केला आहे. या शिलालेखाची काही वैशिष्ट्ये आहेत. शिलालेखाच्या सुरुवातीस धर्म, इंद्र, संकर्षण, वसुदेव, चंद्र, सूर्य, दिक्पाल, वरुण, यम, कुबेर या देवांचा उल्लेख आढळतो. एवढ्या संख्येनं देवांचा उल्लेख एकाच ठिकाणी असलेला हा सर्वांत पुरातन शिलालेख आहे.
       सम्राट अशोकाच्या शिलालेखात अनेक महत्त्वाच्या गोष्टी कोरण्यात आल्या होत्या. अशोकाच्या शिलालेखानंतर याच शिलालेखामध्ये फार मोठ्या प्रमाणात संख्यांचा वापर करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. १, २, ६, ७, १०, १२, १७, १००, २००, ४००, ७००, एक हजार, चार हजार, सहा हजार एवढंच नव्हे तर दहा हजार आणि वीस हजार ह्या संख्याही इथे आढळून येतात.
       महाराष्ट्राच्या तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीवर या लेखाच्या आधारे प्रकाश पडतो. त्याचबरोबर प्राचीन काळी होत असणाऱ्या यज्ञविधींचेही उल्लेख या शिलालेखात आढळतात. या राजवंशातल्या राणी नागणिकानं अश्वमेध, राजसूय, अंगीरस अशा तब्बल १५ यज्ञांचं आयोजन केलं होतं. पुष्कळ प्रमाणात दानधर्मही केला होता. त्याचबरोबर, 'कार्शापण' आणि 'प्रसर्पक' या नाण्यांचा लिखित स्वरूपातील हा पहिला पुरावा आहे. एकप्रकारे हा लेख म्हणजे राणीचं जीवनचरित्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

'सिमुक सातवाहन', 'सिरी सातकर्णी' आणि 'देवी नागणिका' यांच्यासहित परिवारातील इतर सहा महत्त्वाच्या व्यक्ती, असे एकूण नऊ पुतळे इथे कोरण्यात आले होते. पण हे पुतळे काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. जर आज ते पुतळे अस्तित्वात असते, तर बहुदा सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींना आपण 'याची देही याची डोळा' पाहू शकलो असतो.
 
 नाणेघाटातल्या गुहेतील शिल्पाचा पाय शिल्लक असलेला फोटो
 
   अंगियकुलवर्धन वंशातील त्रनकयिरनामक महारठीची कन्या नागनिका ही सातवाहन राजा पहिला सातकर्णी याची पत्नी आणि वेदिश्री राजाची व श्रीमान सती (शक्ती) याची माता होती. पतीच्या निधनानंतर नागनिकेने सातवाहन साम्राज्याची धुरा वाहिली. सम्राज्ञी नागनिकेला ज्या विशेषणांनी संबोधित केले आहे, त्यावरून राणी वैराग्यपूर्ण जीवन जगत होती, हे सिद्ध होते. या लेखाच्या प्रारंभी प्रजापती, धर्म, इंद्र, संकर्षण, वासुदेव, चंद्र, सूर्य, कुमार आणि चार दिक्पाल–यम, वरुण, कुबेर, इंद्र–यांना अभिवादन केले आहे. या शिलालेखात नागनिकेने सातकर्णी राजाबरोबर केलेल्या अनेक श्रौत यज्ञांचा –उदा., दोन अश्वमेध व एक राजसूय तसेच अग्न्याधेय, अनारंभणीय, गवामयन, भगलदशरात्र, आप्तोर्याम, अंगिरसामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसात्रिरात्र, शतात्रिरात्र इत्यादिकांचा– निर्देश आहे. या अनेक यज्ञांच्या उल्लेखावरून तत्कालीन धार्मिक स्थितीत यज्ञसंस्थेचे महत्त्व दिसून येते. या सर्व यज्ञांच्या नामनिर्देशाबरोबरच लेखात ब्राह्मणांना दिलेल्या हजारो गाई, हत्ती, घोडे, रथ, कार्षापण नाणी, सोन्या-चांदीचे अलंकार इत्यादिकांचे उल्लेख आहेत. त्यावरून तत्कालीन आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश पडतो. तसेच या शिलालेखात कार्षापण आणि प्रसर्पक या नाण्यांचा असलेला उल्लेख प्राचीन नाणकशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याव्यतिरिक्त या शिलालेखात आकड्यांचा विपुल प्रमाणात केलेला उल्लेख बघता प्राचीन संख्याशास्त्राच्या प्रगत अवस्थेची कल्पना येते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या जनतेला सातवाहन सम्राज्ञीने केलेल्या धार्मिक कार्याची व सातवाहनांच्या समृद्धीची ओळख व्हावी, असा हा शिलालेख कोरण्याचा उद्देश असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. प्राचीन ऐतिहासिक कालखंडात, या परिसरात मार्गानुक्रमण करणाऱ्या परकीय तसेच भारताच्या विविध प्रदेशांतील व्यापारी, सार्थवाह, यात्रेकरू या सर्वांवर सातवाहन राजवंशाची महानता ठसविण्यात या शिलालेखाने निश्चितच अनन्यसाधारण भूमिका बजावली.
       नाणेघाटापासून सुमारे २८ किमी. अंतरावर असलेल्या जुन्नर या गावी प्रसिद्ध नाणकशास्त्रज्ञ पी. जे. चिन्मुळगुंद यांना इ. स. १९७६ मध्ये सातकर्णी आणि नागनिका यांचे चांदीचे संयुक्त नाणे एका शेतकऱ्याकडून मिळाले. त्यावर ब्राह्मी लिपीत नायनिका (नागनिका) व सिरी सातकनी (श्रीसातकर्णी) असा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे नाणेघाटापासून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर, काही अंतरावर असलेल्या एका पाण्याच्या टाक्यावर असलेला सातवाहन राजा वासिष्ठिपुत्र स्कंद सातकर्णीचा शिलालेख भगवानलाल इंद्रजी यांनी प्रकाशित केला आहे. या दोन्ही बाबींचा उल्लेख नाणेघाटाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे.
        नाणेघाटातील राणी नागनिकेचा शिलालेख आणि सातवाहन राजवंशाचे प्रतिमागृह यांना प्राचीन इतिहासाचे एक विश्वसनीय साधन म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने नाणेघाटाला  ‘राष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ’ म्हणून घोषित केले आहे.
   एकूणच काय, तर नाणेघाटाच्या शिलालेखातून बऱ्याच चकित करणाऱ्या गोष्टी सहजतेने उलगडत जातात आणि त्याचे सर्वस्वी श्रेय जॉर्ज बुल्हर, भगवानलाल इंद्रजी, वा. वि. मिराशी, दिनेशचंद्र सरकार आणि शोभना गोखले यांनाच जाते. ब्राह्मी लिपीमध्ये भारतातील बहुसंख्य शिलालेखांची निर्मिती झाली आहे.
        अशोकाचे प्रस्तरलेख, स्तंभलेख, महाराष्ट्रातील बुद्ध तसेच जैन आणि इतर अनेक लेण्यांमध्ये आढळणाऱ्या शिलालेखांची लिपी ब्राह्मी आहे. त्यामुळं, ज्याला कुणाला ब्राह्मी लिपी शिकण्याची इच्छा आहे, त्यासाठी नाणेघाट सर्वोत्तम शिलालेख किंवा सर्वोत्तम ठिकाण म्हणून आपल्यासमोर उपलब्ध आहे. तेथील अक्षरं ठळक आहेत. सर्वप्रकारच्या शब्दांची आपल्याला ओळख होते.

नाशिकची त्रिरश्मी लेणी :-

सालाहण कुले कन्हे राजिनि नासिककेन
सातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा.

. पांडवलेणीकडे जाणारी झाडीभरली वाट
 
वास्तविक पांडवलेणीचा आणि पांडवांचा काहिही संबंध नाही. पांडवलेणी ही सातवाहन आणि क्षत्रप कालखंडात खोदली गेली. इथल्या कोरीव मूर्तींना पांडव समजले गेले तसेच हे अद्भूत काम पांडवांशिवाय कोणीही करू शकत नाही हा पूर्वापार समज यामुळेच या बौद्ध लेणींना पांडवलेणी हे नाव पडले.
 
अशा स्वरूपाच्या काही शिल्पांमुळेच या लेण्यांना पांडवलेणी असे संबोधले गेले.
 
पांडवलेणीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच प्रथम दर्शन होते ते १० व्या क्रमांकाच्या लेण्याचे. हे लेणे नहपानाचे लेणे अथवा नहपानाचा विहार म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्तंभ, ओसरी, कोरीव शिल्पेम विहार, आतल्या खोल्या अशी याची रचना. ओसरीतील सबंध भिंतीवर विदेशी क्षत्रपांचे शिलालेख आहेत. क्षत्रप हे शक, ग्रीस, इराण मधून आलेले.पण इथल्या संस्कृतीत विरघळून गेलेले. त्यांचे येथील शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात असून मुख्यत्वे त्यांनी दिलेल्या दानाचे आहेत. नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन.


 नहपान विहाराचे प्रथमदर्शन
४ व ५. गज, वृषभ, सिंहशिल्पे (पाठीमागील भिंतीवर क्षत्रपांचे शिलालेख दिसत आहेत)
इथे ओसरीतील स्तंभांवर पुढील बाजूस सिंह, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. पण खरी गंमत आहे ती स्तंभांच्या मागील बाजूस ओसरीतील भागात.
इथे वरच्या भागाकडे नीट निरखून पाहिले असता काहिशी वेगळी शिल्पे दिसतात. शिर गरूडाचे आणि शरीर सिंहाचे अशी ही प्रतिमा. हा आहे ग्रिफिन, एक ग्रीक उपदेवता.
 
 
 
. ग्रिफिन

पुढच्या स्तंभावर तर अजून एक आश्चर्यचकित करणारे शिल्प सामोरे येते. हे शिल्प आहे मानवी शिर असणारे आणि शरीर मात्र सिंहाचे. तोच तो इजिप्तच्या पिरॅमिडजवळ असणारा चिरपरिचित स्फिंक्स.
स्फिंक्स आणि ग्रिफिन या दोन्ही प्राचीन ग्रीक दंतकथांमधील देवता. त्यांचा पांडवलेणीतील समावेश दाखवतो तो प्राचीन काळात चालत असलेल्या पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्‍या व्यापाराचा पुरावाच. व्यापार्‍यांबरोबरच संस्कृतींमधला प्रवास, आदानप्रदानही इथे अधोरेखीत होते.
 
 
 
 
 
 स्फिंक्स

    हे सर्व पाहून विहारात प्रवेश केला, हा विहार प्रशस्त, बरेच कक्ष असलेला व कसलाही आधार नसलेला. सभांडपात समोरच्या भिंतीवर स्तूपाची रचना आणि त्याच्या आजूबाजूला काही मूर्ती कोरल्या आहेत. महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील हा लेण्याद्रीनंतरचा सर्वात मोठा विहार. विहारातून बाहेर आलो, ह्या नहपान विहाराच्या आजूबाजूला काही दुमजली विहार आहेत व जवळच चैत्यगृहही आहे.
 
नहपान विहाराचा अंतर्भाग.
 
आता पाहणार होतो ते गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची यशोगाथा असलेले ३ र्‍या क्रमाकांचे महाराष्ट्रातील कदाचित सर्वात महत्वाचे असे देवीलेणे. हे लेणे खोदवले आहे ते गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री हिने आणि तिचा पौत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी याने. गौतमी बलश्री स्वतःला महादेवी म्हणवून घेत असे म्हणूनही हे देवीलेणे.
 
देवीलेणीचे मुखदर्शन
 
  इथल्याही स्तंभांवर ग्रिफिन, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. या सर्व स्तंभांच्या दर्शनी बाजूवर चौथर्‍याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर रथाचे ओढायचे आडवे खांब कोरलेले आहेत जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यांवर वाहात आहेत.
 
 लेणीचा भार वाहणारे यक्ष

इथेही ओसरीतल्या भिंतीवर गौतमी बलश्रीने कोरलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो.
गौतमीपुत्र सातकर्णी हा त्याकाळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा. त्याच्या उदयाच्या वेळी सातवाहन साम्राज्य क्षीण झाले होते, जुन्नर, नासिक इ. बहुतांश भाग क्षत्रपांनी गिळंकृत केला होता. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडून नासिक जवळच्या सह्याद्री रांगांमध्ये त्याचा संपूर्ण पराभव केला त्याचे शिलालेख या लेणीमध्ये कोरले गेलेले आहेत.हे युद्ध अतिसंहारक झालेले दिसते कारण यात नहपानाचे संपूर्ण क्षहरात कूळ नष्ट झाले. म्हणूनच उएथील शिलालेखात त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले आहे. त्याने नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही प्रस्तुत शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. या शिवाय कर्नाटक, आंध्र मधील जवळजवळ सर्वच प्रदेश त्याच्या ताब्यात होता.
त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'
असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असाही उल्लेख येथे केला गेला आहे. उत्तरेकडील मोहिमेत गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असा उल्लेखही येथील शिलालेखात केला गेला आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदमन ' असेही येथे म्हटले आहे.
 
 गौतमी बलश्रीचा शिलालेख
 
गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री येथील शिलालेखात आपल्या पुत्राचे मोठे लोभस वर्णन करते-
गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने भक्कम आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीवानही आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे.
वरील शिलालेख गौतमीपुत्राच्या मृत्युंनतर गौतमी बलश्रीच्या वृद्धपणी गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुवामीकडून तिने खोदवून घेतला आहे.
१६. गौतमीपुत्राने पाडलेले अस्सल चांदीचे नाणे जे त्याच्या स्वरूपावर प्रकाश टाकते. (विकिपेडीयावरून साभार)
याच शिलालेखांखाली गौतमीपुत्र सातकर्णीची पराक्रमगाथा शिल्पस्वरूपात कोरलेली आहे.
हा एक शिल्पपटच आहे.
या देखाव्यात डावीकडील पट्टीवर एक प्रेमी युगुल दाखवले असून ते गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेलेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे.

. शिल्पपटाचे संपूर्ण दर्शन

     हे सर्व डोळ्यांत भरून पाहातच विहाराच्या आतमध्ये गेलो. हाही एक प्रशस्त विहार. याच्या आत काही कक्ष असून समोरील भिंतीवर स्तूपाची प्रतिमा कोरलेली आहे. या स्तूपाच्या बाजूस स्त्री प्रतिमा. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वर गंधर्व विहार करताना दाखवले आहेत.
 देवीलेणीचा अंतर्भाग
 
विहारातील स्तूपाची रचना

 
 
 
 
 
 
 
 
 


 
 
 
 


        महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणेच इथेही एकमेव चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी रचना. पिंपळपानाकृती कमान हे सर्वच चैत्यगृहांचे वैशिष्ट्य. गौतम बुद्धाला गयेत अश्वस्थ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक म्हणून ही रचना कोरली जाते.
इथल्या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर ही कमान एकावर एक अशी दुहेरी स्वरूपात कोरलेली आहे. फुलाफुलांचे अतिशय नाजूक असे नक्षिकाम, त्यावर बौद्धांचे त्रिरत्न चिन्ह व त्याभोवतीने हत्ती, घोडे इ. प्राणी मोठ्या खुबीने कोरलेले आहेत.
चैत्यगृहावर नेहमीप्रमाणेच कोरलेले यक्ष, गवाक्षांनी केलेला त्रिमितीय आभास, स्तूपांची रचना हे सर्व आहेतच.
चैत्यगृहापाशीच एक शिलालेख आहे.
रञोअमस अरहलयस चालिसलनकस दुहुतुया महाहकुसि-
रिया भतपालिकाया रञोअमस अगियतनकस भदकरिका-
यासा भारिया कपननकमातुय चेतियघरम पावते-
तिरुन्हुमी निठपपित
याचा अर्थ
राजअमात्य चालिसलनाकाची पुत्री, अग्नित्राण भदकरिकाची पत्नी आणि कपननकाची माता महाहकुश्री भट्टपालिकेने हे चैत्यगृह त्रिरश्मी पर्वतावर स्थापित केले आहे.
भट्टपालिका ही नाणेघाटात उल्लेख आलेल्या नागनिकेचा मुलगा महाहकुश्री याची नात असे मानले जाते. याचा अर्थ हे चैत्यगृह क्षत्रप व गौतमीपुत्राच्या आधीचे.
चैत्यगृहात १६ सालंकृत खांबावर तोलले गेलेले गजपृष्ठाकृती छत, मधोमध वाटोळा गुळगुळीत स्तूप, स्तूपाची हर्मिका. इथे छताला लाकडी फासळ्या शिल्लक नाहीत पण त्यांच्या खाचा त्यांचे पूर्वीचे अस्तित्व दाखवतात. खांबांवरही काही शिलालेख कोरलेले आहेत.
 
चैत्यगृहाचे मुखदर्शन


पिंपळपानाकृती कमान व वरील स्तूप-गवाक्षांची रचना
 
कमानीवरील सुरेख ऩक्षीकाम
 
.स्तंभांसहीत असलेला स्तूप
 
   यानंतरचा एक मोठा विहार यज्ञविहार म्हणून ओळखला जातो, इथे यज्ञश्री सातकर्णीचा शिलालेख आहे. हा विहार अतिशय प्रशस्त असून आतमध्ये गर्भगृह खोदलेले आहे तिथे भगवान बुद्धाची भव्य बैठी मूर्ती आहे. स्तंभांवर नाजूक नक्षीकाम.
 
 यज्ञ विहार
 
 यज्ञविहारातील सिंहासनारूढ बुद्धमूर्ती
 
 यज्ञविहारातील सालंकृत स्तंभ
 
   यांनतरचे जवळजवळ प्रत्येक दालन विविध शिल्पांनी भरलेले आहे. दुमजली विहार, कधी मधूनच जैन कला तीर्थंकरांच्या मूर्तींसह भेटीस येते तर कधी बुद्धाच्या विविध प्रतिमा त्यांच्या अनुयायांसह कोरलेल्या दिसतात. काही सिंहासनारूढ, पद्मपाणी, शयनआसनावर आरूढ झालेल्या ह्या बुद्धांच्या चेहर्‍यावरील भावही बदलणारे, कधी शांत, कधी ध्यानस्थ योग्याचा भाव, काही ठिकाणी अर्धोन्मिलित भाव तर काही ठिकाणी प्रसन्न मुद्रा. त्यांच्या भोवती नाग, अश्व, इ. प्रतिमा, बाजूला चामर ढाळणारे सेवक, अवकाशातून पुष्पमाला घेउन आलेले गंधर्व अशी विविध शिल्पे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.


दुमजली विहार
 
विहार
 
विहार
 
 लेणीमार्ग
 
 विविध भावमुद्रेतील बुद्धमूर्ती


 
या सर्व शिल्पांच्या बरोबरीने ब्राह्मी लिपीतले लेखही आपल्याला दिसत असतात.
त्यापैकी काही लेखांची थोडक्यात माहिती देतो.
सिधम सकस दमचिकस लेखकस वुधिकस
विण्हुदतपुतस दसपुरावथस लेणम पोढियो-
चा दो अतो एक पोढि या अपरा--सा मि माता
पितरो उदिसा
शक दमचिकाचा लेखक आणि दशपुराचा रहिवासी विष्णुदत्ताचा पुत्र वुधिकाने एक लेणे आणि दोन पाण्याची टाकी पैकी एक आपल्या माता पितरांसाठी (भेट)दिले आहे
लेणी शब्दाचे प्राचीनत्व इथे दिसून येते. पोढि म्हणजे पाण्याची टाकी त्याचाच अपभ्रंश होऊन (पाण)पोई असा आजचा शब्द रूढ झाला. लेखक ह्या शब्दाचा उल्लेखही येथे महत्वाचा आहे.
अजून एका शिलालेखात यवनांचा पण उल्लेख आला आहे.
सिधम उतरहासा दमतमितियकस योनकस धम्मदेवपुतस इदग्निदतस धम्मतमा
इमा लेणम पावते तिरण्हुमी खनितम अभमतरम च लेणस चेतियघरो पोढियो च मातापि-
तरो उदिस इमा लेणम सवबुधपुजय चतुदिसा भिक्खुसंघसा नियतितम
सह पुतेना धम्मरक्सिता
उत्तरेतील दंतमित्रीचा रहिवासी, धर्मदेवाचा पुत्र, यवन इंद्राग्निदत्त याने त्रिरश्मी पर्वतावरील एका चैत्यगृहानजीकच्या लेण्यात माता पितरांच्या स्मरणार्थ पाण्याची टाकी खोदलेली आहेत. आणि हे लेणे सर्व बौद्धांच्या पुजेसाठी चार दिशांनी आलेले बौद्धसंघां आणि त्याचा पुत्र धर्मरक्षित याने एकत्रितरित्या बांधले आहे.
यवन म्हणजे ग्रीक लोक. इथे येउन स्थायिक झालेल्या यवनांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता हे यावरून सिद्ध होते.
अजूनही असे दातृत्वाचे बरेच शिलालेख या ठिकाणी आहेत.
 
 एक शिलालेख.

शेवटच्या २४ व्या क्रमांकाच्या लेण्यात एका घुबडाचे शिल्प कोरलेले आहे. घुबड आपल्याकडे अपवित्र मानले जाते पण ग्रीकांमधे घुबड देवस्वरूप. ग्रीक उपदेवता अथेनाचे हे शिल्प त्याकाळच्या संस्कृतीवर असलेल्या ग्रीक प्रभावाचेच हे द्योतक.
 
 पांडवलेणीतून होणारे नासिकचे विहंगम दर्शन
 
एकूण २४ लेण्यांची ही माळ शिलालेखांनी, शिल्पांनी, देखण्या ऩक्षीकामाने सालंकृत झालेली आहे. सातवाहन, क्षत्रप, परत सातवाहन परत क्षत्रप अशी विविध स्थित्यंतरे या लेणीने पाहिली आहेत पण एकानेही दुसर्‍याचे बांधकाम उद्धस्त केले नाही. सातवाहन वैदिक, नहपानाच्या काळातील धर्मविहिन क्षत्रप आणि लेणी मात्र बौद्ध, जैन. सुरुवातीची हिनयान आणि नंतरची महायान. अशा विविध संस्कृतींचा संगम असलेली पांडवलेणी त्यांच्या अद्भूत शिल्पकलेसाठी बघायलाच हवीत.
भाषा
 सातवाहन हे महाराष्ट्रीय होत, असे म्हणण्यास दुसरा महत्त्वाचा पुरावा म्हणजे त्यांची भाषा होय. त्यांचे सर्व शिलालेख महाराष्ट्री भाषेत आहेत. त्यांचा एकही लेख द्रविडी भाषेत नाही शिवाय हालसातवाहनाचा गाथासप्तशती हा ग्रंथ महाराष्ट्रीमध्ये आहे. राजशेखरने आपल्या काव्यमीमांसेत, सातवाहन हा राजा कुंतलप्रांती असून तो प्राकृत भाषा बोलतो, असा उल्लेख केला आहे. हा भाषेचा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यावरून सातवाहनांचे महाराष्ट्रीयत्व निश्चित सिद्ध होते. 'गाथा सप्तशती'  हे महाराष्ट्री प्राकृत ( महाराष्ट्री ही प्राचीन भाषापैकी एक असल्याचे संदर्भ आहेत ) भाषेत संकलीत केले आहे. हा संकलनाचा काळ इ.स. पूर्व २ रे शतक ते इ.स. 2 रे शतक असा दिर्घ चारशे वर्षाचा परीघ आहे. हा ग्रंथ इंग्रजी मध्ये अल्बर्ट वेबरने १८८१ मध्ये भाषांतरीत केला आहे. याचा अर्थ मराठी मुळ असलेली ही महाराष्ट्री प्राकृत सर्वसामान्यपणे लिहली जात होती. लिहण्याचा अधिकार त्याकाळी सर्वानाच असावा. कारण हे लिखाण संस्कृत मध्ये नाही . 
 कलिंगराज खारवेल याने सातकर्णीवर स्वारी केली होती. हाथीगुंफा येथील शिलालेखात तिचा उल्लेख असून त्या वेळी त्याने आपले सैन्य पश्चिमेला धाडले असे म्हटले आहे. कलिंगाच्या पश्चिमेस महाराष्ट्र येतो. आंध्र दक्षिणेला आहे. सातकर्णी आंध्रात असता तर सैन्य दक्षिणेला धाडले असे म्हटले असते. 'लीलावई' या महाराष्ट्री काव्याचा कर्ता कवी कौतूहल याने हालसातवाहन हा अश्मक देशातील प्रतिष्ठान (पैठण) नगरीचा राजा होता व त्या प्रांतातील स्त्रिया मरहट्ट स्त्रिया होत्या असे वर्णन केले आहे.
  त्यांची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण ती भाषा घेऊन ते पिढ्यान् पिढ्या अन्य प्रांतात राहिले असते तर त्यांना महाराष्ट्रीय म्हणणे अवघडच गेले असते. कांचीचे पल्लव हे सातवाहनाप्रमाणेच मोठे राजघराणे होते. त्यांची भाषा महाराष्ट्री होती. त्यांची एकंदर चार घराणी झाली. त्यांतील पहिल्या दोन घराण्यांचे काही शिलालेख प्राकृतात आहेत, काही संस्कृतात आहेत, तामीळमध्ये एकही नाही. ते शिव, विष्णू यांचे उपासक होते. त्यांनी याच देवतांची मंदिरे बांधली, तामीळ वाङ्मयातील देवतांची बांधली नाहीत. 

 प्राकृत भाषा :-

prakrut language literature and history

‘प्राकृत भाषा’ म्हणजे नेमकी कोणती भाषा?

प्राकृत भाषा म्हणजे कुठलीतरी एक भाषा, असा अनेकांचा समज आहे. पण, प्राकृत भाषा म्हणजे कोणतीही एक भाषा नाही. प्राचीन काळातील अनेक भाषांना, प्राकृत भाषा म्हणून संबोधले जाते. शौरसेनी प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत, पैशाची प्राकृत आणि अर्धमागधी प्राकृत, अशा अनेक प्राकृत भाषा आहेत. प्राकृत भाषा खूप प्राचीन आहेत. पूर्वीच्या काळी या भाषा लोकांच्या बोलीभाषा होत्या. प्रादेशिक भाषा अस्तित्वात येण्यापूर्वी, प्राकृत भाषा मोठ्या प्रमाणात बोलल्या जायच्या. प्राकृत या शब्दाचा उगम ‘प्रकृती’ या शब्दापासून झालेला आहे. त्याकाळी प्राकृत भाषेत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती होत होती. ‘गाथासप्तशती’ सारखे अनेक प्रसिद्ध ग्रंथ सुद्धा, ‘महाराष्ट्री प्राकृत’ भाषेत लिहिला गेला आहे. प्राचीन काळचे साहित्य जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येते, साहित्यातील राजा, ब्राह्मण आणि काही पुरुष पात्रे संस्कृत भाषांमध्ये बोलतात. पण, त्या साहित्यातील स्त्रीपात्रे, लहान मुले यांची भाषा मात्र प्राकृतच असते. भास, भरतमुनी आणि कालिदास यांच्या नाटकातील स्त्री पात्रांच्या तोंडी प्राकृत भाषाच आहे. ‘शाकुंतल’ या प्रसिद्ध नाटकातही, राजा दुष्यंत शकुंतलेशी संस्कृतात बोलतो. पण, शकुंतला आपल्या सख्यांशी आणि राजा दुष्यंताशीही प्राकृतातच बोलते. जैन समाजातील वाङ्मय मोठ्या प्रमाणात, प्राकृत भाषेमध्येच आहे. जैन समाजाचे अनेक धार्मिक ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये आहेत. त्यामुळे प्राकृत भाषेला जैन समाजात खूप महत्त्व आहे.

प्राकृत भाषांचा त्यांच्या उगमापासून ते ‘अभिजात’ दर्जा मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता?

मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड यांसारख्या प्रादेशिक भाषांचा उगम झाल्यानंतर, हळूहळू प्राकृत भाषा मागे पडत गेल्या. पण प्राकृत शिकणारे, प्राकृत भाषेचा अभ्यास करणारे लोक अस्तित्वात होते, ते आजही आहेत. उत्तर भारतात या भाषांचा अभ्यास अधिक प्रमाणात झाला. प्राकृत भाषा साहित्यिक, इतिहासकार अशा सगळ्यांसाठीच मार्गदर्शक आहेत. त्यामुळे या भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा म्हणून, प्रयत्न सुरू होतेच. शिवाय ‘अभिजात’ दर्जा जे निकष आहेत की, भाषा 1 हजार 500 ते दोन हजार वर्षे जुनी असावी, त्यांना समृद्ध वाङ्मयीन परंपरा असावी, त्या सगळ्या निकषांमध्येही या प्राकृत भाषा बसत होत्या. त्यामुळे या भाषांना ‘अभिजात’ दर्जा प्राप्त मिळाला आहे.

प्राकृत भाषा बोलीभाषा म्हणून व्यवहारातून का मागे पडत गेल्या?

साधारण आठव्या ते दहाव्या शतकांपर्यंत या सगळ्या प्राकृत भाषा बोलल्या जात होत्या, या भाषांमध्ये साहित्य निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत होती. पण, जेव्हा प्रादेशिक भाषांचा उगम झाला, संस्कृत आणि प्राकृतचा अपभ्रंश होत होत जेव्हा प्रादेशिक भाषा अस्तित्वात आल्या, तेव्हा प्राकृत भाषा मागे पडल्या गेल्या. जेव्हा नवीन भाषा अस्तित्वात येतात, तेव्हा बर्‍याचदा जुन्या भाषा मागे पडत जातात, हे आपण आताच्या काळातही पाहतो, त्यावेळीही तेच घडले. महाराष्ट्रात मराठी, पंजाब भागात पंजाबी, बंगाल प्रदेशात बंगाली, अशा प्रत्येक प्रदेशात प्रादेशिक भाषा अस्तित्वात आल्या. त्या प्रदेशातील लोक प्राकृत भाषांऐवजी, त्यांच्या प्रादेशिक भाषा बोलू लागले. परिणामी प्राकृत भाषांचा वापर कमी होऊ लागला. प्राकृत भाषांचा अभ्यास होत होता, साहित्यनिर्मितीही काही प्रमाणात सुरू होती. पण, त्या बोलीभाषा म्हणून वापरल्या जात नव्हत्या. आताच्या काळातही प्राकृतची तीच स्थिती आहे. प्राकृत भाषांचा अभ्यास होतोय, प्राकृत भाषांमध्ये लोक शिक्षण घेत आहेत. पण, त्या तेवढ्या पुरत्याच मर्यादित आहेत. त्यांचा व्यवहारात तसा वापर होत नाही.

आताच्या काळात प्राकृत भाषांचे सांस्कृतिक महत्त्व काय आहे?

आताच्या काळातही या भाषा खूप मार्गदर्शक आहेत. या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली आहे. हे साहित्य आपल्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप मार्गदर्शक ठरते. आपला देश, देशाची त्याकाळची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती कशी होती, या सगळ्याचे प्रतिबिंब त्याकाळी लिहिल्या गेलेल्या, प्राकृत साहित्यामध्ये उमटले आहे. त्यामुळे या साहित्याचा अभ्यास आपल्याला, इतिहासाचे अभ्यास करताना महत्त्वाचे ठरतो. इतिहासाचा सबळ पुरावा म्हणून या भाषांची मदत आपल्याला होते. सोबतच आपल्या प्रादेशिक भाषा सुद्धा संस्कृत आणि प्राकृत भाषांचा आधार घेत, अस्तित्वात आल्या आहेत. त्यामुळे या भाषांचा, त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना सुद्धा, आपल्याला प्राकृत भाषांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भाषेचा आणि साहित्याचा अभ्यास करणार्‍या आणि आवड असणार्‍या विद्यार्थ्यांना तर या प्राकृत भाषांचा अभ्यास खूप उपयोगी असतो. कारण पूर्वीच्या काळी साहित्य कसे होते, ते कसे बदलत गेले, या सगळ्याची माहिती प्राकृत भाषांमधून मिळते.

‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे प्राकृत भाषांना फायदा होईल किंवा काय फायदा होणे अपेक्षित आहे?

पूर्वी प्राकृत भाषा अनेक विद्यापिठांमध्ये शिकविल्या जायच्या. पण, नंतरच्या काळात त्या विद्यापिठांनी प्राकृत भाषा शिकविणे बंद केले. आता ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे, प्राकृत भाषांचे महत्त्व वाढेल आणि त्या विद्यापीठांमध्ये प्राकृत भाषा शिकवण्याची सोय पुन्हा केली जाईल. पण पुन्हा एक मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे प्राकृत भाषा फक्त विद्यापीठांमध्ये पुन्हा शिकवून उपयोग नाही. त्यामध्ये नोकरीच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना त्या भाषांमध्ये आपले भवितव्य दिसायला पाहिजे. कारण, प्राकृत भाषांच्या बाबतीत आधीही हेच घडले होते की, त्या शिकवल्या जात होत्या. त्यांचा अभ्यास केला जात होता. पण, त्यांचा व्यवहारात वापर होत नसल्यामुळे, त्या मागे पडत गेल्या. आता पण जर फक्त शैक्षणिक पातळीवर म्हणजे शाळांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये त्या सुरू केल्या, तर फक्त इतिहासाची किंवा साहित्याची आवड असणारे विद्यार्थीच या भाषा शिकतील. या भाषांमध्ये ज्ञानार्जन होईल. काही प्रमाणात साहित्यनिर्मितीही होईल. पण, विद्यार्थी त्या दैनंदिन जीवनात बोलणार नाहीत. हल्ली विद्यार्थी किंवा त्यांचे पालक शिक्षणासाठी कोणताही विषय निवडताना, त्यात नोकरीच्या किंवा रोजगाराच्या संधी आहेत हे बघूनच निवडतात. त्यामुळे अभिजात दर्जा मिळाल्यामुळे प्राकृत भाषा शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये तर शिकविल्या जातीलच, तसेच त्या भाषांमध्ये नोकरीच्या संधीही निर्माण होणे खूप आवश्यक आहे.

प्राकृत भाषा पुन्हा व्यवहारात आणण्यासाठी, त्यांच्या संवर्धन आणि विकासासाठी शिक्षण क्षेत्रात काय पाऊले उचलली गेली पाहिजेत?

शिक्षण क्षेत्रात या भाषांची आवड मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी पाऊले उचलली गेली पाहिजेत. आपण आज पाहतो की, मुलांना फ्रेंच, जर्मन, जपानी अशा पाश्चिमात्य भाषांबद्दल खूप आकर्षण वाटते. मुलांना जरी त्या भाषांमध्ये नोकरी करायची नसली, तरी मुले त्या भाषा आवड म्हणून शिकतात. काही मुले तर शालेय वयापासून एखादी पाश्चिमात्य भाषा शिकत असतात, तर काही त्यात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणही घेतात. काही शाळांमध्ये तर या भाषा शिकवण्याची सोयही आहे. तशीच सोय प्राकृत भाषा शिकवण्याचीही असली पाहिजे. आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या भाषा शिकवण्याची सोय केली पाहिजे. 30 मिनिटांचा का होईना, पण एखादा तरी तास प्राकृत भाषांचा असायला हवा. तरच शालेय वयापासून मुलांची या भाषांशी ओळख होईल. त्यांना भाषेबद्दल आवड निर्माण होईल आणि पुढे जाऊन मुले या भाषांमध्ये आणि भाषांसाठी काम करण्यासाठी तयार होतील. आता फक्त जैन समाजातील मुले त्यांच्या धर्मग्रंथांची भाषा असल्यामुळे, काही प्रमाणात ही भाषा शिकतात. पण, असे प्रयत्न केले तर इतर मुलेही या भाषांकडे वळतील.

 सातवाहन कला आणि व्यापार :-

          सातवाहनांनी अनेक पराक्रम गाजवले, तसेच आपला साम्राज्यविस्तार केला. सत्करणी याने सौराष्ट्र, बेरार, मालवा, कोकण ही राज्ये आपल्या साम्राज्याला जोडली. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन करताना असे म्हटले जाते की, ’त्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी पीत असत.’ आपल्या कार्यकाळात त्याने दोन अश्वमेध व एक राजसूय यज्ञ केले. याच्या कारकिर्दीत मध्य भारत सातवाहनांच्या अधिपत्त्याखाली असल्याचे आढळते. तो वैदिक धर्माचा पोषक असून अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीतही त्याचे धोरण उदार होते. त्याने बौद्धांच्या तत्कालीन संघांना बरीच मदत केली होती. सध्या मुंबई येथील कार्ले नावाच्या बौद्ध संघाला त्याने त्यावेळी करजक नावाचे गाव दान केले होते. त्याने आपल्या कालखंडात अनेक नाणी पाडली. त्यातील बर्‍याचशा नाण्यांवर सत्करणीचा चेहरा मुद्रित केलेला आढळतो. त्याने जवळपास २० वर्षे शकांबरोबर संघर्ष केला. अखेर नाशिकमधील गोवर्धनजवळ त्याने शक राजा नहपान याच्याशी युद्ध करून त्याला पराजित केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे युद्ध होते. या युद्धानंतर सातवाहनांचा उत्कर्ष सुरू झाला. शक राज्यकर्ता नहपानच्या पराभवानंतर सत्करणीने त्याचे सर्व शिक्के ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्याचे मुद्रण केले.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर ही शकांची राजधानी तसेच प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्यावर सातवाहनांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले स्वकीय साम्राज्य होते. कल्याण, सोपारा (नालासोपारा), भोगवर्धन (भोकरदन), तगेर (तेर), करहाटत (कर्‍हाड), नेवासा ही शहरे सातवाहनांच्या काळात समृद्ध झाली. या शहरांतील उत्खननातून सातवाहनांचा इतिहास जगासमोर आला. सातवाहन राजकुमारांना ’कुमार’ असे संबोधिले जात असे. सरकारी खजिन्याचे प्रमुख स्त्रोत हे भूमिकर, मिठावरील कर तसेच न्यायशुल्क हे होते. सातवाहनांचे महारथी, महासेनापती, महाभोज असे तीन प्रकारचे सामंत असत. व्यापार्‍यांना ’नैगम’ म्हटले जात असे. व्यापारी समूहाच्या प्रमुखाला ’सार्थवाह’ संबोधले जात असे.
        सातवाहन काळात उद्योग आणि शिल्पकला उच्च कोटीला गेली होती. समकालीन पुराव्यात कुंभार, तेली, पितळी, बुरुड, लोहार आणि सोनार या कारागिरांचा उल्लेख येतो. प्रत्येक व्यवसाय त्या त्या श्रेणीत असे. यांच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणले जात असे. या श्रेणी कौशल्यावर आधारित असे. श्रेष्ठीना सुरक्षा आणि मान व प्रतिष्ठा लाभत असे. श्रेष्टी हे त्याकाळी आजच्या बँकेप्रमाणेच ऋण म्हणजे कर्ज घेउन त्यांच्याकडून धन घेत असत. या श्रेष्ठींसाठी मंदीरे, बागा, विश्रामगृह इत्यादी बनवले जात असे. हे श्रेष्टी राज्यकारभारात देखील रस घेत असत.
सातवाहनांच्या प्रदीर्घ शासन पद्धतीमुळे व्यापाराची भरभराट झाली होती. त्यांनी तगर क्षेत्राला (म्हणजेच आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधील तेर) आपली आर्थिक राजधानी बनवली होती.
नाणेघाटाबरोबरच इतरही अनेक घाटवाटा व त्यांचे संरक्षक दुर्ग मुख्य सह्यधार व त्यांच्या उपत्यकेत निर्माण केले गेले. बौद्ध धर्माला उदार राजाश्रय दिला गेला. ग्रीक, रोमन लोकांबरोबर व्यापाराला सुरुवात झाली. रोम, इस्तंबूल, अलेक्झांड्रिया आदी शहरांमधून येणार्‍या मणी, सोने, चांदी, रत्ने, प्रवाळ, नक्षीदार भांडी, उंची मद्यपेये इ. वस्तू समुद्रमार्गे चेऊल (चौल), कलियान (कल्याण), श्रीस्थानक (ठाणे), शूर्पारक (नालासोपारा) इ. बंदरात येऊन पडू लागल्या. सार्थवाह बैलांच्या तांड्यावर त्या वस्तू लादून खोदीव घाटमार्ग पार करू लागले व पैठण, तेर, नाशिक, ब्रह्मपुरी आदी शहरांत येऊ लागले व तिथे त्या वस्तू देऊन तलम रेशमी वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, कापूस, हस्तीदंती वस्तू, लोणी, तूप, मध, चंदन आदी माल परत समुद्रापार नेऊ लागले. हळूहळू व्यापाराची भरभराट होऊन सातवाहन साम्राज्य समृद्ध होत गेले. राज्य विस्तार पावू लागले. पैठण ही सातवाहनांची राजधानी. तिची किर्ती दूर दूर पसरू लागली व याच व्यापारावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सातवाहनांच्या समृद्ध राज्यात क्षत्रपांचा प्रवेश झाला.
         याच वंशातील यज्ञश्री सातकर्णीच्या नाण्यांवर शिडाच्या जहाजाची प्रतिकृती सापडते. यावरून भारताचा इतर देशांची समुद्रमार्गे व्यापार होत होता असे दिसते. तेर येथील उत्खननामध्ये सापडलेले मद्यकुंभ हे रोमन पद्धतीचे आहेत. यावरून रोमन पद्धतीची मातीची भांडी येथे निर्यात केली जात होती, तसेच भारतातील मसाल्याचे पदार्थ, सोने, रेशमी वस्त्रे इत्यादी वस्तूंची रोममध्ये आयात होत होती.
या ठिकाणी झालेल्या उत्खननांत काही हस्तिदंती मूर्ती, रोमन मद्यकुंभ (ॲम्फोरा), मणी, दागदागिने, मातीच्या आणि धातूच्या वस्तू, खेळणी, ठसे अशा बऱ्याच कलाकृती मिळाल्या. विशेष म्हणजे, कोल्हापूरमध्ये रोमन धाटणीची (?) समुद्रदेवता, रोमन कांस्य धातूच्या वस्तूंचा साठा, तर भोकरदन व तेर इथल्या उत्खननांत काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या.

 

 






 तेर येथील उत्खननामध्ये एक हस्तीदंताची बाहुली सापडली आहे आणि विशेष म्हणजे अगदी अशीच बाहुली इटलीच्या एका संग्रहालयामध्ये जतन करून ठेवली आहे. यावरून तेरचा रोमन साम्राज्याशी थेट व्यापार होत होता हे सिद्ध होते. याशिवाय, इतरत्र काही रोमन नाणी आणि देवतांचे ब्राँझचे पुतळे सापडले. त्यांवरून, व्यापाराबरोबरच सातवाहन आणि रोमन यांच्यातली कलेमधली देवाणघेवाण स्पष्ट होते. जवळजवळ अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी भारतीय कलाकारांनी घडवलेला हा कलात्मक खजिना पाहिल्यावर मन आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही!
     शेती हा तत्कालीन समाजाचा प्रमुख व्यवसाय असला तरी गान्धिक (सुगंधी पदार्थाचे व्यापारी) सुवर्णकार, स्थपती, कोलिक (वस्त्र विणणारे) मालाकार इत्यादी व्यवसायिक देखील सुस्थितीत होते. सातवाहन काळामध्ये झालेल्या व्यापाराच्या भरभराटीमुळे महाराष्ट्राला केवळ भारतीय नाही तर जागतिक अर्थ पटलावर मानाचे स्थान प्राप्त झाले होते. 
      सातवाहनांच्या शिलालेखात गाय, भुमी आणि गाव बक्षीस म्हणून दिल्याचा उल्लेख आला आहे. यामधून सातवाहन कालात भुमी म्हणजे जमीन आणि शेती किती महत्वाचे होते हे समजते. शेतीसाठी लोखंडाची अवजारे, धान्य लावण्यासाठी शेतीची अवजारे यामुळे शेतीच्या विकासात मोठा वाटा आहे. सातवाहन काळात डाळी, ज्वारी, बाजरी, लवंग, तीळ, मिरी आणि कापुस यामुळे शेती उत्पादनाची निर्यात वाढली. शेती उत्पादनावर १/६ भाग कर रुपात वसूल केला जात असे. जी जमीन राजकीय व्यक्तींना किंवा धार्मिक साधकांना अनुदान स्वरुपात दिली गेली असेल तरी सुध्दा त्याचा कर त्या जमीनीचा मालक घेत असे. या करावर राजाचा कोणताही अधिकार नसे. राजा भोग नावाचा कर वसुल करत असे. 

   त्यांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. बौद्ध-जैनांना त्यांनी उदार आश्रय दिला. जैनांची लोहगड, पाले व खानदेशातील लेणीही याच काळात निर्माण झाली. सातवाहनांच्या काळात बौद्ध मंदिरे आणि बौद्ध भिक्षुकांच्या निवासस्थानांची बर्‍याच प्रमाणात बांधणी झाली. स्थापत्य कलेमध्ये सातवाहनांनी महाराष्ट्राला एका वेगळ्याच उंचीवर नेले होते. कार्ले येथील विहाराच्या प्रवेशद्वारावरील नेत्रदीपक नक्षीकाम पाहिल्यावर याची खात्री पटते. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील ८,९,१०,१२ व १३ क्रमांकाच्या लेण्या याच कालखंडातील आहेत. भारतीय चित्रकलेमधील प्राचीन चित्रकला जी ९ व १० क्रमांकाच्या लेण्यांमध्ये आहे ती याच कालखंडातील आहे.   मौर्यांनी सुरू केलेली ही लेणीपरंपरा सातवाहनांनी पुढं विकसित केली. यामध्ये चैत्य आणि विहार हे नवीनात नवीन. सह्याद्री पर्वतरांगेतल्या कोंडिवते, भाजे, तुळजा, पितळखोरा, कोंडाणे, अजिंठा, नाशिक, बेडसा, जुन्नर, कार्ले, कुडा, महाड, कराड आणि कान्हेरी अशी ठिकाणं सातवाहनांच्या स्थापत्याची साक्ष देतात. नाशिकच्या तसेच इतर अनेक लेण्यात त्यांचे महत्वाचे शिलालेख कोरलेले आहेत. यात भिक्षुसंघाला दिलेले दानलेखही आहेत.
सातवाहनकालीन समजल्या गेलेल्या चैत्यगृहांच्या रचनेत दोन्ही बाजूंना स्तंभांची रांग व मागच्या बाजूला अर्धवर्तुळाकार जागा आहे. तिथं गोलाकार स्तूप आणि त्याभोवती प्रदक्षिणापथ, स्तूपावर हर्मिका व एकावर एक तीन छत्रं, स्तूपाच्या समोर मध्यभागी दरवाजा इत्यादी व त्यावर आत प्रकाश पडावा म्हणून अर्धवर्तुळाकृती मोठं वातायन असे.




त्याच्या आकारावरून त्याला घोड्याच्या नालाची खिडकी (Horseshoe Window) म्हणण्याचा प्रघात पडला. याचं उत्तम उदाहरण म्हणून भाजे इथल्या लेणी सर्वांत प्राचीन आणि प्रतिभासंपन्न समजल्या जातात. भाजे-पितळखोरा-कार्ले ही लेणी शिल्पशैलीच्या दृष्टीनं लक्षणीय आहेत. त्यांत स्त्रीपुरुष नर्तकांची दम्पती व मिथुनशिल्पांचा समावेश आहे.
त्यांतल्या काही चित्रांत गौतम बुद्धांच्या चरित्रातले प्रसंग आणि इतर काहींत जातककथा दाखवल्या आहेत. राजांपासून सामान्य ग्रामिकांपर्यंत विविध श्रेणींच्या आणि औद्योगिक लोकांनी दान देऊन ही लेणी शिल्प-चित्रांनी भूषवली होती, असं काही लेखांवरून समजतं.


    भारतातली सर्वांत प्राचीन ऐतिहासिक चित्रं सातवाहनकाळातली आहेत. यांमध्ये अजिंठा गुंफा क्रमांक ९ आणि क्रमांक १० यांचा समावेश होतो. जातककथा हे चित्रांचे मुख्य स्रोत असून गौतम बुद्धांचं जीवन आणि त्यांचं पूर्वजीवन अशा विषयांवरच्या प्रसंगांतून संपूर्ण स्तंभ आणि छत आच्छादलेलं होतं.
त्याचबरोबर फुलांच्या आणि प्राण्यांच्या प्रतिमा अतिशय कौशल्यानं साकारलेल्या पाहायला मिळतात. ही चित्रं भाजे, अमरावती, सांची आणि जगय्यापेट इथल्या शिल्पांशी, मुद्रा आणि वैशिष्ट्यं यांच्याबाबतीत साधर्म्य बाळगतात.
सातवाहनकालीन लेणी हीनयान पंथांची असल्यामुळं बुद्धमूर्ती अथवा त्यांची शिल्पं आढळत नाहीत; परंतु बौद्धपद, भद्रासन, स्तूप, बोधिवृक्ष आदींमधून त्यांचं अस्तित्व सूचित होतं. त्या काळी यक्षसंप्रदाय प्रचलित असल्यानं यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती स्तूपांच्या कठड्यांवर कोरलेल्या, भारहूत इथल्या शुंगकालीन स्तूपाशी संलग्न असलेल्या सापडल्या आहेत.
 




 
 
   इसवी सन पूर्व दोनशेच्या आसपास नागनिका या सातवाहन राणीने राज्यकारभार चालवला होता. इतकेच नव्हे तर तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल. त्याकाळी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास मान्यता होती. सातवाहन राजांनी वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले. वैदिक धर्माने इतके ऊंच शिखर गाठले होते की त्याची भुरळ परकीय शकांना देखील पडत होती. कार्ले येथील लेण्यातील दोघा ग्रीकांची नावे धर्म आणि सिंहध्वज अशी आहेत. तर शकाच्या एका शासकाचे नाव वृषभदत्त असे आहे. वैदिक धर्माला राजाश्रय असला तरी इतर धर्माचा देखील सन्मान केला जात होता. गौतमीपुत्राने नहपानावर विजय मिळवल्यानंतर लागलीच त्याच्या आईने म्हणजे गौतमी बलश्रीने नाशिक येथे बौद्ध भिक्षूंकरिता चैत्य व विहार खोदले होते. तसेच त्यांना कसायला एक शेत देखील दिल्याची राजाज्ञा नाशिक येथील देवी लेण्यात सापडते. कार्ले-भाजे येथील लेण्यांमध्ये गौतमीपुत्राने बौद्ध श्रमणांच्या धार्मिक कार्यासाठी विहार खोदून दिले होते. बौद्धांच्या उपजीविकेसाठी ठराविक निधी राजकीय खजिन्यातून देण्याची व्यवस्था केली होती. धार्मिक सहिष्णुतेचा पाया सातवाहनांनीच भारतामध्ये घातला असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.
        सातवाहनकालीन गुंफा पुणे जिल्ह्यातील कार्ले, कान्हेरी, भाजे येथे आढळून आली आहेत. सातवाहनांची नगररचना सर्व सोईंनी युक्त अशी होती. विविध नमुन्यांच्या पक्क्या भाजलेल्या विटा, छपरावर टाकण्यासाठी पन्हाळी कौले, भूमिगत गटार योजना, कोरीव नक्षीकाम अशी सुसज्ज अशी नगररचना यांच्या काळात विकसित होती.

 त्यांनी मंदिरांना सहाय्य तर केलेच पण वैदिकांसाठी काही यज्ञही करवून घेतले. ब्राह्मणांना भूमिदान अथवा जहागिरी देण्याची प्रथा सर्वप्रथम सातवाहनांनी सुरू केली.पण या धार्मिक कार्यासोबतच त्यांची स्मृती चिरकाळ टिकणारी झाली ती त्यांनी बांधलेल्या चेउल आणि कल्याण येथील व्यापारी बंदरांमुळे. त्यांनी बांधलेल्या व्यापारी मार्गांमुळे. उद्योग-व्यवसायाला व विदेश व्यापाराला दिलेल्या अपार प्रोत्साहनामुळे. महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळ होता असे म्हटले तरी त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही.

ह्या सातवाहनांनीच सह्याद्रीत बांधलेल्या बहुतांश किल्ल्यांचा वापर गुप्तांनी,चालुक्यांनी, राष्ट्रकूटांनी, शिलाहारांनी व नंतर यादवांनी केला तसेच अधिक किल्ले बनवून भरही घातली. यादवसत्तेच्या पाडावानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी मात्र हे किल्ले, येथील प्रदेश आपल्या साम्राज्यात आणिला पण पुढे ह्याच सह्याद्रीच्या एका सातवाहननिर्मीत शिवनेरी नामक दुर्गावर छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला व पुढे ह्याच किल्ल्यांच्या सहाय्याने तसेच नवे किल्ले उभारून महाराष्ट्राला पुन्हा स्वराज्याचे दिवस दाखवले. असे सातवाहनांचे मोठे ऋण इये देशी आहे.

  सिंधूक अत्य्हवा सिमुख सातवाहनाने काण्वांचे राज्यपालपद धुडकावत स्वतंत्र सत्ता स्थापन केली ती सनपुर्व २२० मध्ये. सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमानात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही.

 सातवाहनकालीन जाते :-

      पूर्वी घरोघरी महिला जात्यावरच दळण दळत असत; मात्र काळाच्या ओघात जाते मागे पडले. आता फक्त लग्नाच्या विधीपुरतेच जात्याचे महत्त्व मर्यादित राहिले आहे. सर्वांनी उभ्या दांड्याचे जाते पाहिले आहे; पण शहरात आडव्या दांडीचे दुर्मिळ जाते जतन करून ठेवण्यात आले आहे, तेही सातवाहनकालीन, म्हणजे सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचे. ते दगडी जाते एवढे जड आहे की फिरवण्यासाठी दोन महिला लागत.   
‘कोंबड्याची बांग.. आली कानावर बाई... ये गं दळण दळाया, सई बाई गं बाई....सासराच्या जात्यात... जीव अडकतो लई, गरागरा फिरताना.. हात थांबतच न्हाई’, अशा ओव्या म्हणत सासुरवाशिणी पहाटे पायलीपायलीने दळण दळत असत. भक्तीची आस आणि प्रापंचिक दु:खाची न संपणारी वीण यांचे दर्शन पहाटेच्या जात्यावरच्या ओव्यांमधून होत असे. या जात्यांची व ओव्यांची आठवण शहरातील पुराणवस्तू संग्राहक रमेश रुणवाल यांनी त्यांच्याकडील सातवाहनकालीन जाते दाखविल्याने झाली. टिळकपथ रोडवरील आपल्या दुकानातील माळवदावर त्यांनी हा दुर्मिळ, ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला आहे. जाते तर सर्वांना माहीत आहे. मग, या जात्याचे वैशिष्ट्य काय... असे आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल.
आजही अनेकांच्या घरात दगडी जाते आहे; पण त्यास फिरविण्यासाठी एकच दांडा असतो; मात्र रुणवाल यांच्याकडील जात्याला उभा नव्हे आडवा दांडा आहे. एक नव्हे, तर दोन महिला समोरासमोर बसून या जात्यावर दळण दळत असत. इतिहास संशोधकांच्या मते सातवाहन काळात या जात्याची निर्मिती झाली असावी. तेव्हा जात्याला आडवी दांडी असे. 
              ३६ वर्षांपूर्वी नेवासा येथील श्री मोहिते यांच्या घरी हे आडव्या दांडीचे जाते सापडले. आता  जात्याच्या दगडाची झीज झाली आहे. खालच्या पाळूला तडेही गेले आहेत. आता हे जाते जतन करणे अवघड होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तुसंग्रहालय किंवा सोनेरी महल येथील पुरातनवस्तुसंग्रहालयात हे प्राचीन जाते देण्याचा विचार आहे.
अशी जाती दुर्मिळच 
इतिहास संशोधक डॉ.रा.श्री. मोरवंचीकर हे जात्याचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले की, ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात मी  सातवाहनकालीन जात्याचा उल्लेख केला आहे. सिंधू संस्कृतीत पाट्यांचा वापर केला जात असे. पाट्यांप्रमाणे सातवाहन घरांत जाती सापडली आहेत. धान्य दळण्यासाठी जात्याचा उपयोग प्रथम याच काळात केला गेला. या जात्याची खालची तळी पातळ व बर्हिगोल असून, वरची तळी उभट गोल आकारात असत. वरच्या तळीस उंचावलेले तोंड असून, या तोंडाच्या गळ्यातून आडवा लाकडी दांडा घालण्याकरिता आरपार छिद्र आहे. वरची तळी खालच्या तळीमध्ये अडकवलेल्या उभ्या लोखंडी खिळ्याभोवती बसविली जाते. दोन महिला परस्परांसमोर बसून आडव्या दांड्याच्या  मदतीने जाते गोलाकार फिरवीत. आजच्या जात्याच्या सुटसुटीतपणापुढे हे जाते थोडेसे अवघड वाटते.
उत्खननात सापडतात...
आडवी दांडी असलेले हे जाते सातवाहनकालीन आहे. कोल्हापूर, शिरपूर, नेवासा, भोकरदन या पट्ट्यात उत्खन्नात अशी जाती सापडली आहेत. ५० वर्षांपूर्वी नेवासा भागात डेक्कन कॉलेजने डॉ. साकलिया यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन केले होते. त्यात आडव्या दांडीचे तीन जाते सापडले होते. काही संग्राहालयांत अशी जाती आपणास बघण्यास मिळतील. 

सातवाहनकालीन स्त्रिया

         सातवाहन राजघराण्यामध्ये अनेक पराक्रमी लढवय्ये राजे होऊन गेले. सिमुक, सातकर्णी, पुळुमावी, वेदिश्री, घराण्याचं नाव ज्याच्यावरून पडलं तो सातवाहन, हाल हे एकाहून एक सरस राजे या घराण्याने दिले. या प्रत्येक राजाचे खास वैशिष्ट्य आहे. गाहा सत्तसई म्हणजेच गाथा सप्तशती लिहिणारा ग्रंथकर्ता हाल हा सातवाहन राजा कवीही होता. वासिष्ठीपुत्र पुळुमावी, गौतमीपुत्र सातकर्णी  यांचे पराक्रम आणि दिग्विजय शिलालेखांतून पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहेत. या वीर राजांच्या नावांमध्ये एक खासियत आढळते, ती म्हणजे त्यांच्या नावातच आलेले त्यांच्या आईचे नाव. याचा अर्थ हे घराणे मातृसत्ताक असावे किंवा मग त्यांच्या घराण्यातल्या स्त्रियांना आदराचे आणि महत्त्वाचे स्थान दिले जात असावे हे नक्की. त्यावेळच्या समकालीन इतर राज्यकर्त्यांच्या वंशावळीत चुकूनमाकूनच अशी उदाहरणे सापडतात. याच्या मुळाशी असलेले एक खंबीर कारण म्हणजे सासरप्रती असलेला जाज्वल्य अभिमान. सातवाहन घराणेसुद्धा तसेच होते. पराक्रमी, महत्त्वाकांक्षी आणि आपल्या जिंकलेल्या प्रदेशाचे उत्कृष्ट नियोजन करणारे यशस्वी राज्यकर्ते. आणि त्यांच्या स्त्रियाही तशाच खंबीर आणि दृढनिश्चयी. कसे होते सातवाहन? त्यांच्या स्त्रिया कशा असतील आणि कसा असेल तो एकूण कालखंड? हे जाणून घ्यायचे असेल,  तर काळाचा पट अनेक शतके मागे जाऊन उलगडावा लागेल.सातवाहनांचा इतिहास जाणून घेताना इसवी सनाच्या आधी दुसऱ्या शतकात जाऊन डोकवावे लागते. घराण्याचा मूळपुरुष हा किताब सिमुकाचा जरी असला, तरी त्याचा मुलगा पहिला सातकर्णी अधिक प्रसिद्ध आणि पराक्रमी राजा होता यावर अभ्यासकांमध्ये दुमत नाही. त्याची राणी म्हणजे नागनिका.
          सातवाहन वैदिक धर्माचे कट्टर पुरस्कर्ते होते. नागनिकेने विवाहपश्चात सासरचा धर्म अंगीकारला आणि तो जोपासलाही. खरेतर या काळात श्रौतधर्म मागे पडून यज्ञ, याग करण्याची प्रथा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना नागनिकेने अश्वमेध, गवामयन, दाशरात्रसारखे मोठे यज्ञ केल्याची नोंद सापडते. याशिवाय सातकर्णी आणि नागनिका या दोघांनी मिळून  राजसूय, अग्न्याध्येय, अन्वारंभणीय, अंगारिक भगल, अंगिरसामयन, त्रयोदशरात्र, अप्तोर्याम, गर्गत्रिरात्र, शततिरात्र,  छंदोपवमानत्रिरात्र असे अनेक यज्ञ केले. नागनिका स्वतः यज्ञदीक्षादिकात निष्णात होती आणि तिने या सर्व यागांमध्ये  उत्साहाने भाग घेतला होता. या सर्व यज्ञांत विद्वान ब्राह्मणांना हत्ती, घोडे, रथ, सोन्याचांदीचे अलंकार,  कार्षापण (चांदीची नाणी) आणि गायी दान केल्याचे अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे.

       पुणे जिल्ह्यात जुन्नरजवळ कोकणात उतरणाऱ्या प्राचीन नाणेघाटात काही सातवाहनकालीन गुंफा आहेत.  एका गुंफेत असलेली नागनिकेने कोरवून घेतलेली शिल्पे आणि मोठा शिलालेख प्रसिद्ध आहे.  तो अनेक मुद्द्यांसाठी विचारात घ्यावा लागतो. राजकीय व धार्मिकदृष्ट्या तर तो महत्त्वाचा ठरतोच,  पण तत्पूर्वी त्या शिलालेखावरून नागनिकेला लाभलेले अग्रस्थान, राजघराण्यातील एक ज्येष्ठ स्त्री म्हणून तिचे  महत्त्व स्पष्ट होते. वास्तविक पाहता स्त्रीचा उल्लेख तिच्या पतीनंतर केला जात असे. पण नाणेघाटातल्या गुंफेतील शिलालेखात नागनिकेचा उल्लेख तिच्या पतीपूर्वी केला आहे, हे विशेष. तसेच नागनिकेच्या वर्णनपर लेखातूनसुद्धा तिचे राजमान्य व्यक्तिमत्त्व समोर येते. सातवाहनांनी वैदिक धर्मास उदार आश्रय दिला, हे नागनिकेच्या लेखातून स्पष्ट होते. नाणेघाटामध्ये आढळणाऱ्या शिल्पांमध्ये सिमुक राजानंतर प्रथम नागनिकेचा पुतळा दिसतो.  शेजारी तिचा पती सातकर्णीचा पुतळा आहे. या घराण्यातील तिचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट करण्यासाठी तिची प्रतिमा  सिमुकानंतर कोरण्यात आली आहे. सातकर्णीनंतर त्याच्या दोन मुलांचे पुतळे आणि मग तिच्या वडिलांचा पुतळा आढळतो. सातवाहन कुळात आपल्या पित्याचा पुतळा कोरणारी नागनिका ही पहिली राणी असावी. अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून  सातकर्णीने आपले व नागनिकेचे असे चांदीचे जोडनाणे प्रचारात आणले होते. त्यावरून त्यांच्या वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो. सातवाहनकाळात स्त्रियांचे राजकीय स्थान काय होते हे समजून घेताना सर्वात पुढे नाव येते ते नागनिकेचेच.







     सातवाहन कालखंडाच्या उत्तरार्धात उदयास आलेली गौतमी बलश्री ही सातवाहन राजवंशातली स्त्री राजमाता म्हणून प्रसिद्ध पावल्याचे  नाशिक येथे सापडलेल्या शिलालेखातून स्पष्ट होते. या लेखात तिचा पुत्र सातकर्णी याने केलेल्या पराक्रमाचे वर्णन आहे. सदर शिलालेख वाचताना त्यातले माता-पुत्रप्रेम सोडल्यास गौतमीपुत्र एक मोठा राज्यकर्ता होण्यामागे गौतमी बलश्रीचा किती मोठा सहभाग होता याचा निर्देश नक्की होतो. आणि हेच तिचे मोठे राजकीय योगदान ठरते. बलश्री ही  शिवस्वाती राजाची राणी होती असे समजते. नाशिकच्या लेखात ती स्वतःला महादेवी म्हणवते, त्यावरून शिवस्वातीला  महाराज पदवी असावी असे वाटते. ती अतिशय महत्त्वाकांक्षी स्त्री होती. सातकर्णीच्या कारकिर्दीच्या चोविसाव्या वर्षातला तिचा हा लेख आहे. त्याने आपल्या घराण्याच्या नावामागे गौतमीपुत्र असे मातृपरक नाव धारण केले होते. त्याच्यानंतर त्या घराण्यातल्या पुढच्या अनेक राजांनी अशा प्रकारची मातृपरक नावे लावलेली आढळतात.  उदा. वासिष्ठीपुत्र पुळुमावी, कौशिकीपुत्र सातकर्णी, माढरीपुत्र सातकर्णी इत्यादी. कधी आईच्या तर कधी तिच्या माहेरच्या गोत्रावरून आपले नाव धारण केलेले आढळते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नाशिकमधील तिसऱ्या  क्रमांकाच्या लेण्यास देवी लेणे म्हटले जाते, कारण गौतमी बलश्रीच्या आदेशावरून या लेण्यात लेख कोरला गेला. गौतमीपुत्राने क्षत्रप राजा नहपानाचा पराभव केल्यानंतर तेथील बौद्ध भिक्षूंना राजाश्रय दिला. परंतु, दरम्यानच्या काळात क्षत्रपांनी ते दान केलेले शेत व गाव पुन्हा जिंकून घेतले होते. म्हणून सातकर्णीने भिक्षूंना दुसरे दान दिले. हे दान गौतमी बलश्री व गौतमीपुत्र सातकर्णी यांनी मिळून दिले, असे या लेखात म्हटले आहे. यावरून तिचे राजकीय महत्त्व अधोरेखित होते. तिच्या नातवाच्या कारकिर्दीत तिने हा शिलालेख लिहून घेतला आहे. तिचे वय तेव्हा त्र्याऐंशीच्या आसपास असावे. बलश्री अशी एक भाग्यवान राजमाता होती, जिने पुत्राची, प्रपौत्राची कारकीर्द अनुभवली होती. उतरत्या वयात तिच्या पराक्रमी पुत्राच्या आठवणींनी व्याकूळ झालेले तिचे मन त्या लेखातून स्पष्ट जाणवते. याशिवाय सातवाहनांनी बौद्ध धर्मासही उदार आश्रय दिला हे बलश्रीच्या नाशिक शिलालेखांतून उघड होते.  सातवाहन राजे स्वतः वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते, पण बौद्ध धर्मालाही त्यांनी वेळोवेळी संरक्षण दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.  शिवस्वाती राजा कट्टर वैदिक धर्माभिमानी असला, तरी त्याची पत्नी गौतमी बलश्री बौद्ध धर्मावर नितांत श्रद्धा बाळगून होती  असे दिसते. कुडा येथील एका ब्राह्मण उपासकाच्या भार्येने बौद्ध धर्म स्वीकारल्याचे तिथल्या शिलालेखांतून सिद्ध होते. . त्या काळात यज्ञसंस्थेप्रमाणे पुण्यप्राप्तीसाठी लोकांचा कर्म मार्गावर आणि पूर्वकृत्यावर भर असे. कर्ममार्गात दानधर्म, तीर्थयात्रा, व्रते, उपवास यांचा अंतर्भाव होतो, तर पूर्वकृत्यात लोकोपयोगी कार्यांचा समावेश होतो. सातवाहन काळात ही सर्व कर्मे केली जात होती. नागनिका उपवास करणारी, तपस्विनीप्रमाणे जगणारी, दीक्षा, व्रते, यज्ञ, अनुष्ठान करणारी  होती. तर राणी गौतमी बलश्री तप, दम व उपवास करणारी, दान, क्षमा, अहिंसा या तत्त्वांनुसार जगणारी सम्राज्ञी होती.  या एकाच वंशातील भिन्न कालखंडातल्या स्त्रियांनी राजवंश बलशाली होण्यासाठी केलेले प्रयत्न किती समान आहेत हे  नाणेघाट व नाशिकच्या शिलालेखांमधून सिद्ध होते.बलश्रीची सून, वासिष्ठीपुत्र पुळुमावीची राणी ही क्षत्रप राजा रुद्रदामन  याची कन्या होती. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर काही काळ सातवाहन व क्षत्रप यांच्यात मैत्रीसंबंध प्रस्थापित झाले आणि या  काळातच रुद्रदामनने आपली कन्या पुळुमावीस दिली असल्याचे दिसते. या विवाहाला राजकीय महत्त्व प्राप्त झालेच, पण  त्याचबरोबर सांस्कृतिक महत्त्वही मिळाले. त्यामुळे सातवाहनांच्या वेशभूषा, केशभूषेत फार मोठा बदल झालेला जाणवतो.  शिल्पांमध्ये पुळुमावी ग्रीक रोमन राजपुत्रासारखा दाखवलेला आढळतो, एवढेच नव्हे त्याने काढलेल्या नाण्यातही या  दोन भाषा दिसतात. नाणी आणि शिल्पांमधून पुळुमावीच्या पत्नीचा घराण्यावर पडलेला प्रभाव आणि राजकीय हस्तक्षेप स्पष्ट दिसतो.सातवाहन काळातल्या स्त्रियांसंबंधी महाराष्ट्रात अजूनही काही लेख सापडतात. महाडजवळ कोल येथील  एका उपासकाची कन्या आणि शिवदत्ताची पत्नी धर्मश्रीने लेणे कोरल्याचे म्हटले आहे, पण तो खर्च कसा केला ते समजत  नाही. काही दाने परिव्राजिकांनी दिली होती. ती त्यांनी बहुधा खास वर्गणी गोळा करून दिली असावीत. असे एक दान  दिल्याचा उल्लेख कुडा येथील शिलालेखात सापडतो. ते दान भदंतपातीमित व भदंतआगिमित यांची भाची आणि परिव्राजिका नागनिका हिची कन्या पदुमलिका हिने दिले होते. तिने त्यात एक लेणे व टाके खोदून भिक्षुसंघाला दान दिल्याची नोंद लेखात सापडते. .या सगळ्या शिलालेखांमधून स्त्रियांचे आर्थिक सामर्थ्य चांगले सबळ असावे असे वाटते. पण तत्कालीन  सामाजिक परिस्थिती निराळे रूप दर्शवते. तत्कालीन सूत्रग्रंथामधून असे निर्देशित होते, की कुटुंबप्रमुखाच्या निधनानंतर  त्याच्या मालमत्तेच्या वाटण्या झाल्यास पितृक संपत्तीची समान विभागणी होत असे. पती-पत्नी संयोगातून कुटुंब निर्माण  होत असल्याने पत्नीच्या वेगळ्या अस्तित्वाची दखल सूत्रकारांनी घेतलेली नाही. त्यामुळे तिचा स्वतंत्र हिस्सा नाकारला आहे.







      परंतु पती परदेशी असताना पतीच्या संपत्तीमधून नैमित्तिक दान देण्याचा तिचा अधिकार मान्य केल्याचे दिसते. म्हणजे स्त्रीला आर्थिक साहाय्य मिळत नसे. ती आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान नसावी. कारण सेवा करणाऱ्या, म्हणजे दासी म्हणवणाऱ्या स्त्रियांना अर्थस्वरूपात मोबदला मिळत असे. त्या स्त्रिया सोडल्या, तर इतर स्त्रियांच्या हातात अर्थसामर्थ्य नव्हते. म्हणजे दानांपुरते स्त्रियांना अर्थसामर्थ्य मिळत होते असा निष्कर्ष निघू शकतो. मग स्त्रियांना शिक्षण मिळत होते का? असाही प्रश्न उमटतो.सातवाहनकालीन स्त्री वेदकाळाइतकी शिक्षित नसली, तरी ती सुशिक्षित होती हे नक्की. त्याकाळी मुलींचे उपनयन संस्कार होत असत आणि त्या वयात येईपर्यंत शिक्षण घेत असत. नंतर सामान्यतः त्यांचा  विवाह होत असे. पण काही मुली लग्न न करता वेदाध्ययन करीत असत. त्यांस ब्रह्मवादिनी म्हणत असत. काही स्त्रिया आजन्म ब्रह्मचर्य पाळीत आणि अध्यापनाचे कार्य करीत असत. त्यांना उपाध्याया म्हटले जाई. वर उल्लेखिलेल्या राजकन्या व राजस्त्रिया मात्र सुशिक्षित होत्या हे निश्चित, कारण त्यांनी त्यांच्या हयातीत वर उद्धृत केल्याप्रमाणे शिलालेख करवून घेतले होते. त्याकाळी विवाह फक्त अनुलोम पद्धतीने म्हणजे समानवर्णीयच प्रचलित होते, असा उल्लेख गाथा सप्तशतीमध्ये आढळतो. प्रतिलोम निषिद्ध मानला जाई. वैवाहिक जीवनात पुत्र नसेल तर नियोग समाजमान्य होता. दत्तक वारस नामंजूर होता. सातवाहन वंशावळीत खरोखरच एकही दत्तकपुत्र दिसून येत नाही. सातवाहनकाळात  कुटुंबपद्धती संयुक्त प्रकारची अस्तित्वात होती हेसुद्धा या शिलालेखांमधून समजते. स्त्रीची भूमिका प्रामुख्याने गृहिणीचीच  होती. पण त्या समाजात पडदापद्धती नव्हती. सातवाहनकालीन शिल्पांमध्येही कुठेही पडदानशीन स्त्रिया आढळत नाहीत. उलटपक्षी समाजात स्त्रियांसाठी खास सणसमारंभ आयोजित केले जात. इंद्रध्वज, मदनोत्सव व फाल्गुनोत्सव हे तत्कालीन प्रसिद्ध उत्सव होते. त्यांच्या पोषाखाची व अलंकरणाची कल्पना सातवाहनकालीन शिल्पकलेतून येते. आणि त्यांच्या केशभूषा तर फारच वैशिष्ट्यपूर्ण आढळतात. भारहूत, सांची, कार्ले, पितळखोरा येथील सातवाहन लेण्यांमधील शिल्पांवरून समकालीन वेशभूषेची माहिती मिळते. उत्खननांमध्ये सापडलेल्या हस्तिदंती बाहुल्यांवरून स्त्रिया सकच्छ वस्त्रे नेसत असत व अंगावर लांबलचक ओढणी पांघरत असत. शिल्पांमध्येही अशाच प्रकारची रचना दिसते. दोन्ही बाजूंना मोठमोठे सोगे सोडलेले दिसतात. तलम, रेशमी वस्त्रे समाजातील वरच्या वर्गात लोकप्रिय असल्याचे शिल्पांवरून समजते. त्यांच्या वस्त्रविशेषांत स्त्रिया बहुतकरून नेसूचे आणि उत्तरीय अशी वस्त्रे परिधान करताना दिसतात.  गाथा सप्तशतीमध्ये कंचुकी व साडीचाही उल्लेख आढळतो. सातवाहनकालीन स्त्रिया दोन प्रकारची वस्त्रे वापरीत. उत्तरीय व कमरेखाली लुंगीसारखे, शिवाय कंचुकी, पायजम्यासारखी इतरही वस्त्रे वापरत. साडीही काही ठिकाणी परिधान केलेली आढळते. स्त्रियांची वस्त्रे साधारणपणे तोकडी होती. अजिंठ्यातील सातवाहनकालीन लेण्यांमधल्या चित्रांवरून रंगीबेरंगी वस्त्रेही प्रचलित असावी असे समजते. .स्त्रियांच्या आकर्षक केशभूषेत अनेक पेडांच्या वेण्या व विपुल केशसंभार ही त्यांची वैशिष्ट्ये मानवी लागतील. त्यात इतकी विविधता आहे, की तो एक स्वतंत्र अभ्यासाचा  विषयच होईल. केस भरपूर असतील, तर उंच केशरचना केली जाई अन्यथा साधी भांगवेणी घातली जाई.  केस बांधण्यासाठी मोत्याची झालर वापरली जात असे. विपुल केशसंभार दर्शविणाऱ्या स्त्री-मूर्ती नेवासे, पैठण येथे मिळाल्या आहेत. आश्चर्य म्हणजे चेहऱ्याची ठेवण सगळीकडे जवळपास सारखीच आहे. गोल चेहरा, गुबगुबीत गाळ, मोठे पसरट नाक, मोठे डोळे, खालचा ओठ थोडासा जाड अशी सर्वसाधारण सातवाहन स्त्री-प्रतिमा दिसते. राजस्त्रिया पायांत पैंजण, हातांत कंकण, बोटांत अंगठ्या, बाहूंवर केयूर, कमरेवर मोत्यांचा किंवा रत्नांचा कंबरपट्टा अशी आभूषणे वापरत असत. केसांत गजराही माळत असत. स्त्रियांना दागिन्यांचा विशेष सोस होता, असे सातवाहनकालीन शिल्पे पाहिल्यावर वाटते. त्या काळात स्त्रिया कोणते अलंकार वापरत असाव्यात यासाठी शिल्पे बघावीत.  शिल्पांमधून व मृण्मूर्ती मृण्मय मूर्तींमधून बांगड्या, मणी, ताईत, पाटल्या, गोठ, कर्णभूषणे, बाजूबंद, मेखला, अनेकपदरी हार, कपाळावर बिंदी इत्यादी शृंगारसाधनांची रेलचेल दिसते. एका उत्खननात सापडलेला तांब्याचा आरसा  विशेष उल्लेखनीय आहे. काचेचे, हस्तिदंताचे, धातूचे दागिने वापरले जात. यावरून त्याकाळातल्या स्त्रियांना शृंगाराची  किती आवड होती ते लक्षात येते.गाथा सप्तशतीमध्ये सातवाहन काळात समाजात आढळणारी अनेक रूपे व भिन्न स्वभाव  याचे वर्णन केले आहेत. 
     कन्या, प्रेयसी, पत्नी, सवत, व्यभिचारिणी, आई, सासू, सून, आत्या, मामी, गणिका या सर्व नात्यांमधून स्त्रीरूप प्रकटते. या सर्वांत तिला पुरुषाच्या अर्धांगिनीचे रूप दिले गेले आहे. पण तिला घरदार, शृंगार, विरह या चौकटीत गुंतवून ठेवले आहे असे जाणवते. असे असूनही स्त्रियांचा राजकीय सहभाग दर्शवणाऱ्या काही शिल्परचनाही उपलब्ध आहेत. भाजे इथल्या शिल्पपटात एक राजपुरुष चार घोडे जोडलेल्या रथातून भरधाव दौडताना दिसतो.  या रथाबरोबर काही अश्वारूढ स्त्रियाही दिसतात आणि एकीच्या पायात रिकीब दिसते. रिकिबीचे हे अत्यंत प्राचीन  उदाहरण म्हणता येईल. त्या शिल्पपटावरून स्त्रिया राजाच्या अंगरक्षक म्हणून कार्य करत होत्या असे म्हणता येऊ शकेल. त्या शिल्पपटात एका स्त्रीरूपी राक्षसाच्या अंगावरून रथ जातो आहे, असे चित्र असल्याने किमान राजाच्या स्त्री शत्रूंपासून  संरक्षण करण्याचे काम त्या करत असाव्यात असे म्हणायला हरकत नसावी. याचा अर्थ, स्त्रियांना घोडेस्वारी आणि सैनिकी शिक्षणही दिले जात असावे असा तर्क वाजवी ठरतो. स्त्रियांना या काळात सन्मान मिळत होता हे तर या सगळ्या  लक्षणांवरून निश्चित करता येते. यात आणखी एका लक्षणाची दखल घ्यावी लागेल, ती म्हणजे सतीप्रथा. सातवाहन  काळात सतीप्रथा बहुतेक नसावी. तत्कालीन लेखांमध्ये किंवा धर्मसूत्रांमध्येही तसा उल्लेख अजिबातच आढळत नाही.  स्मृतिग्रंथांमध्ये पतीनिधनानंतर विधवेने आमरण संयमी वृत्तीने यमनियमांचे आचरण करीत पतिव्रतेचे जीवन जगावे असे म्हटले आहे. त्याप्रमाणे नागनिका व बलश्री या राण्या आपले वैधव्य व्यतीत करत होत्या आणि सती गेल्या नव्हत्या. कारण नाणेघाट व नाशिक शिलालेखांचा तसा पुरावाच उपलब्ध आहे.अशा सुवर्णकाळातल्या महाराष्ट्राची भूमी कशी असेल  याची कल्पना करून मनाला अतिशय हर्ष होतो, अभिमान वाटतो. आजही त्या इतिहास, पराक्रम गाजवलेल्या जागा,  ती शहरे, लेणी आणि शिल्पपट मुद्दाम पाहावेसे वाटतात. इतक्या मोठ्या कालखंडात होऊन गेलेल्या सगळ्या महान  नृपतींचे आभार मानावेसे वाटतात. पण सातवाहनांच्या आटपाट नगराची गोष्ट केवळ त्यांच्या पराक्रमापर्यंत आणि  शौर्यगाथेपर्यंत येऊन संपत नाही हे महत्त्वाचे. म्हणतात ना, यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच असते.  आणि सातवाहनांच्या अशा अनेक भिंतीसारख्या सबळ आणि महत्त्वाकांक्षी स्त्रियांनी ते पुराव्यानिशी सिद्ध केले आहे.

मातृवंशपद्धती ?
 सातवाहन घराण्यात मातृवंशपद्धती होती, मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती, असे एक मत आहे. डॉ. केतकर व इतिहासाचार्य राजवाडे या मताचे पुरस्कर्ते आहेत. या घराण्यात गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुलुमायी अशी मातेचा निर्देश करणारी नावे दिसतात. यावरून या कुळात मातृवंशपद्धत होती असे राजवाडे म्हणतात. (राधामाधवविलासचंपू, पृ. १८० ) त्यांच्या मते मगधातून आलेल्या महाराष्ट्रिकांनी महाराष्ट्र बसविला. त्यांच्यात ही पद्धत नव्हती. यावरून सातवाहन हे. त्यांच्यात मातृवंशपद्धती असल्यामुळे, महाराष्ट्रीय नव्हत असेही राजवाडे म्हणतात डॉ. केतकरांनी गौतमीपुत्र, वसिष्ठीपुत्र इ. नावांचा आधार घेतलाच आहे. शिवाय भावाच्या घरी राहात असलेल्या एका ब्राह्मणविधवेला शेषापासून सातवाहन हा मुलगा झाला या दंतकथेचाही आधार त्यांनी घेतला आहे. शिवाय कोचीन, मलबार या प्रदेशांत स्त्री माहेरीच भावाजवळ राहाते, पती वरचेवर बदलते, पतीच्या घरी जात नाही अशी जी रुढी आहे, तिचा निर्देश केला आहे. सर्वात आश्रर्याची गोष्ट म्हणजे या दोघाही थोर पंडितांनी प्रत्यक्ष सातवाहनांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले आहे. पुराणे व कोरीव लेख यांच्या आधारे त्यांचा जो इतिहास दिसतो त्यावरून असे दिसते की प्रत्येक ठिकाणी पित्यामागून पुत्रच गादीवर आला आहे. चुकूनमुद्धा याउलट दिसत नाही. नागनिका, गौतमीवलश्री या स्त्रिया आपल्या पतीच्या घरीच रहात होत्या. आपले पती, पुत्र, नातू यांच्याशी असलेले नातेच त्या अभिमानाने सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर तापसीव्रताने जन्मक्षेप करतात. अशा स्थितीत या घराण्यात मातृकन्यापरंपरा होती, मातृ सत्ताककुटुंबपद्धती होती, ( डॉ. केतकर, प्राचीन महाराष्ट्र भाग २ रा, पृ. ५१ ) अशी विधाने करणे युक्त नाही.
 डॉ. गोपाळाचारी यांनी आपल्या प्रबंधात विस्तृत विचार केला आहे. ते म्हणतात, सातवाहन घराण्यात ही मातेवरून निर्देश करण्याची पद्धत गौतमीपुत्रापूर्वी नव्हती. पुढे ती त्यांच्या घराण्यात दिसून येते. तशीच महारष्ट्रातील महारथी महाभोज या घराण्यातही दिसून येते. वेदकाळातील कौशिकीपुत्र, आलंबीपुत्र अशी मातृनिर्देश करणारी नावे आढळतात. बौद्धवाङमयातही वैदेहीपुत, मोगलीपुत अशी नावे ठेवण्याची पद्धत दिसते. माळव्यातल्या अनेक शिलालेखांत असा मातेवरून केलेला पुत्राचा निर्देश दिसतो. बुल्हरच्या मते आजही रजपुतांत अशी चाल आहे. कदाचित राजाला अनेक राण्या असतात, त्यामुळे पुत्राचा निर्देश करताना मातेचा निर्देश करण्याची पद्धत पडली असेल; पण त्यावरून त्या घराण्यात मातृसत्ताकपद्धती किं मातृवंशपद्धती होती असे म्हणण्याला अर्थ नाही.

प्रारंभकाळ

   सध्याच्या घडीला आपल्याला माहिती असलेला महाराष्ट्राचा इतिहास हा सातवाहनांपासून सुरु होतो!! त्याच्या आधी महाराष्ट्रात काय झाले याची काहीच माहिती आपल्या दुर्दैवाने उपलब्ध नाही. तर, सातवाहन हा महाराष्ट्रातील पहिला राजवंश आणि म्हणूनच याचा अभ्यास करणे हे जास्त महत्वाचे ठरते. मग त्याच्या आधी महाराष्ट्र नव्हता का? तर याचे उत्तर होता असे होते. लेण्यातील काही लेखांमधून आपल्याला त्या काळी असलेल्या रठीक, भोजक अशा लहान सरंजाम सत्ताधार्यांची माहिती मिळते. पण सातवाहनांच्या इतिहासापासून आपल्याला महाराष्ट्र कसा होता, इथले सामाजिक जीवन कसे होते, व्यापार कसा होता, राज्यशासन पद्धत काय होती, कौटुंबिक जीवन कसे होते याची माहिती मिळते यातच सातवाहनांचे महत्व दिसून येते.
      सलग साडेचारशे वर्ष या भूमीवर राज्य करणारा असा हा महापराक्रमी वंश. याधी किंवा या नंतर असा कोणताही राजा झाला नाही की त्याने किंवा त्याच्या वंशाने साडेचारशे वर्ष सलग राज्य केले. बरे, नुसते राज्यच केले नाही तर त्या राज्यात संपन्नता आणली, व्यापार वाढवला, कला व स्थापत्य यात भरीव कामगिरी करून पुढच्या पिढीला राज्य कसे करावे याबद्दल प्रेरणा दिली. सातवाहन राजाच्या यशाचे गमक तिथे आहे की त्याच्या राज्यातील जनता ही सुखी होती.
       आपले दुर्दैव की या राजाबद्दल आपल्याकडे अस्सल साधने फार तोकडी आहेत. याचे कारण म्हणजे त्या काळात लिखाण फार कमी झाले किंवा इतिहास जतन करून ठेवायला हवा असा विचार तेव्हा कुणाच्या मनाला शिवला नाही. विविध लेण्यांमध्ये असणारे विविध लेख यांवरून आपल्याला त्या काळातील समाजजीवनाची, तसेच राजांची माहिती मिळते इतकेच. पुराणात सातवाहन राजांच्या वंशावळी दिल्या आहेत मात्र सध्या उपलब्ध असलेली पुराणे ही तेव्हाची लिहिलेली पुराणे असतील का अशी शंका घ्यायला सहज वाव आहे. आता हेच बघा, वायू, ब्रम्हांड, भागवत व विष्णू ही सर्व पुराणे ३० सातवाहन राजे होऊन गेले असे सांगतात मात्र प्रत्यक्षात नवे देताना ही संख्या कमी होते. मत्स्य पुराण २९ राजे सांगते पण नावे ३० देते. आता अभ्यासकांनी ३० हा आकडा मान्य करून पुढे अभ्यास केला ती गोष्ट वेगळी. सातवाहनांचा कालावधी कोणता याबाबत पण अभ्यासकात एकमत नाही. कुणी म्हणते ख्रिस्तपूर्व पहिले शतक तर कुणी म्हणते दुसरे.

         अशोकाच्या मृत्युच्या सुमारास सातवाहननामक पुरुषाने महाराष्ट्रातील प्रतिष्ठान या नगरीत सातवाहनसत्तेची स्थापना केली. मौर्य साम्राज्य दक्षिणेस म्हैसूरपर्यंत पसरलेले होते. अर्थात महाराष्ट्राचा त्यात अंतर्भाव असलाच पाहिजे असे काही तज्ज्ञाना वाटते. अपरान्त म्हणजे उत्तर कोकण यावर मोर्यसत्ता होती याबद्दल वाद नाही. पण अशोकाचे शिलालेख महाराष्ट्रात नाहीत यावरून त्याची सत्ता महाराष्ट्रावर नसावी, असे डॉ. केतकर म्हणतात. मात्र त्यांचे धर्मप्रसारक महाराष्ट्रात पोचले होते हे त्यांना मान्य आहे. ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, प्रकरण ४४ वे.) पण याविषयी निश्चित असे काही सांगणे कठीण आहे. सातवाहन हे मौर्याचे मांडलीक होते, असेही एक मत आहे. पुराणात त्यांना कोठे आंध्र म्हटले आहे, कोठे आंध्रभृत्यही म्हटले आहे. आंध्रभृत्य हा समास कर्मधारय करून तो आंध्र हेच भृत्य, असा काही तज्ज्ञ सोडवितात. आणि सातवाहन हे मूळचे आंध्र होते व ते मौर्यांचे भृत्य होते म्हणून त्यांना आंध्रभृत्य म्हटले असावे, असे अनुमान करतात; पण यालाही निश्चित असा पुरावा काही नाही. सातवाहन या राजाने अशोकाच्या अखेरीच्या काळात आपले स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात स्थापन केले एवढेच. त्याची जी नाणी अलीकडे सापडली आहेत त्यांच्या आधारे, आपणास आज म्हणता येते. हे राज्य स्थापिताना त्याला मौर्यसत्तेशी लढावे लागले असा कोठेही उल्लेख नाही. असा काही लढा झाला नाही यावरून मौर्यांचे साम्राज्य महाराष्ट्रात नसावे किंवा असल्यास या वेळी ती सत्ता अगदी दुर्बळ झाली असावी असे अनुमान करावे लागते.
          यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सातवाहनांच्या प्रारंभकाळाचा. अशोकाच्या मृत्यूच्या सुमारास म्हणजे इ. स. पूर्व  २३६ च्या आसपास सातवाहन सत्तेला प्रारंभ झाला असे म. म. मिराशी यांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. पण डॉ रा. गो. भांडारकर यांच्या मते हा काळ इ. स. पू. ७३ असा आहे आणि डॉ. डी. सी. सरकार यांच्या मते तो इ. स. पूर्व ३० पर्यंत अलीकडे येतो. डॉ. गोपाळाचारी यांनी ' सातवाहन साम्राज्य ' या आपल्या लेखात इ. पू. २३५ हा काळ निश्चित केला आहे तो मला ग्राह्य वाटतो. शकक्षत्रप रुद्रदामा याचा गिरनार येथील शिलालेख हा इ. स. १५० या वर्षांचा आहे हे बहुमान्य झाले आहे. त्यात त्याने दक्षिणापथपती शातकर्णी याचा उल्लेख केला आहे. हा शातकर्णी सातवाहन म्हणजे शिवश्री पुलुमायी होय, हेही आज बहुमान्य झाले आहे. सातवाहन वंशात एकंदर ३२ राजे होऊन गेले. त्यात शिवश्री पुलुमयी हा सव्विसावा राजा होय. पुराणात त्याच्या आधीच्या राजांच्या राजसत्तेची गणना दिली आहे; तीवरून हिशेब करता इ. स. १५० च्या मागे आपणांस इ. स. पूर्व २३५ या वर्षापर्यंत जावे लागते. जुन्नर जवळील नाणेघाटात सातवाहनांचे जे शिलालेख उपलब्ध झाले आहेत ते त्यांतील लिपीवरून (अक्षरांच्या ठेवणीवरून ) इ. स. पूर्व २०० ते २५० या काळातील असले पाहिजेत असे व्यूलर या पंडिताचे मत आहे. आणि बहुतेक संशोधकांना ते मान्य आहे, असे डॉ. केतकर म्हणतात. ( प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला पृ. ४०८ व ४०९ ) वर उल्लेखिलेल्या 'काँप्रिहेनसिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया' या ग्रंथात डॉ. जे. एन. बॅनर्जी यांनी 'उत्तर व पश्चिम भारतातील क्षत्रपसत्ता' हे प्रकरण लिहिले असून त्यात त्यांनी डॉ. के. गोपळाचारी यांच्याच मताला पुष्टी दिली आहे. सातवाहनसत्तेच्या अखेरीविषयी फारसे मतभेद नाहीत. तेव्हा इ. स. पूर्व २३५ ते इ. स. २२५ हा सातवाहन राजवंशाचा सत्ताकाळ होय, हे डॉ. के. गोपाळाचारी यांचे मत मान्य होईल असे वाटते. मूळ कुळपुरुष सातवाहन हा अर्थातच इ. पू. २३५ पूर्वीचा होय.
    मूळ संस्थापक श्री सातवाहन याचा पुराणात किंवा कोणत्याही शिलालेखात उल्लेख नसल्यामुळे त्याच्याविषयी अधिक काहीच माहिती उपलब्ध नाही. १९४५ साली त्याची नाणी सापडली तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाचीही कोणास माहिती नव्हती. त्या नाण्यांमुळे तो मूळ संस्थापक होता हे कळले हेच विशेष होय. पुराणांनी व शिलालेखांनी उल्लेखिलेल्या या वंशातील पहिला राजा म्हणजे सिमुक सातवाहन हा होय. नाणेघाटातील कोरीव लेखात त्याची भग्नप्रतिमाही आहे. तिच्याखाली 'राया सिमुक सातवाहनो सिरिमातो' असा त्याचा निर्देश आहे. मौयसत्ता ज्या कोणत्या रूपात होती ती नष्ट करून त्याने स्वराज्याची स्थापना केली. त्या वेळी त्याला रथिक व भोज या जमातींची फार मदत झाली, म्हणून त्याने स्वतः राया ही पदवी स्वीकारली त्यावेळी त्यांच्या प्रमुखांना महारथी ही पदवी दिली व त्यांच्याशी सोयरीकही केली. त्याने एकंदर इ. पू. २३५ ते इ. पू. २१३ असे तेवीस वर्षे राज्य केले. त्याच्या राज्याचा विस्तार हा शिवछत्रपतींच्या प्रारंभीच्या विस्ताराइतका अल्प, प्रतिष्ठानच्या आसपासच्या परिसरापुरताच असणार हे उघड आहे.
        तर इथून झाली सातवाहन नावाच्या एका अध्यायाला सुरुवात.  सातवाहन कुळातील राजांची वंशावळ खाली दिलेली आहे. ही वंशावळ मिराशी यांच्या पुस्तकातील आहे तसेच श्री. जोगळेकर यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेली वंशावळ सुद्धा सोबत देत आहे. 
 

 
 
हे फोटो श्री जोगळेकर यांच्या गाथा सप्तशती या पुस्तकातील आहेत. त्यांनी प्रत्येक राजाचे सुंदर विश्लेषण केले आहे
 


ही वंशावळ ही मिराशी यांनी त्यांच्या ‘सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास व कोरीव       लेख’ या  पुस्तकात दिली आहे.

आंध्र वंशातले राजे आणि त्यांचा अंदाजे कार्यकाल(वर्षे) असा:

सिमुक(सिंधुक, शिप्रक)                            २३
कृष्ण(भात)                                        १०
श्रीशातकर्णी(श्रीमल्‍लकर्णी)                         १०
पूर्णोत्संग(पौर्णमास )                               १८
स्कंधस्तंभ                                          १८
शातकर्णी(शांतकर्णी, सातकर्णी)                    ५६
लंबोदर                                             १८
आपीतक(आपीलक, दिविलक)                   १२
मेघस्वाति                                          १८
स्वाति(पतुमत्, अटमान्)                           १८
स्कंदस्वाति                                         ७
मृगेंद्रस्वातिकर्ण                                      ३
कुंतलस्वातिकर्ण                                    ८
स्वातिवर्ण                                          १
पुलोमावी                                           ३६
अरिष्टकर्ण(अनिष्टकर्ण)                             २५
हाल                                                  ५
मंतलक(पत्तलक, मंदुलक)                          ७
पुरिकषेण(प्रविल्‍लसेन, पुरीषभीरु)                  २१
सुंदरशातकर्णी(सुनंदन)                             १
चकोरशातकर्णी                                     ६ महिने
शिवस्वाति                                          २८
गौतमीपुत्र शातकर्णी(गौतमीपुत्र)                     २८
पुलोमत्                                             २८
शातकर्णी(शिवशातकर्णी)                            २९
शिवश्री                                               ७
शिवस्कंध                                            ३
यज्ञश्री शातकर्णी                                      २९
विजय                                                 ६
चंडश्री                                                १०
पुलोमत्                                              ७.

  सातवाहन राजांची पुर्ण पार्श्वभुमी जाणून घेतल्यानंतर एकेक सातवाहन राजांची सविस्तर माहिती घेउया. 

राजा सिमुक :-

 राजा सातवाहनां नंतर पुराणामध्ये उल्लेख असलेला राजा सिमुक हा सातवाहन राज्याचा सत्ताधीश झाला. साधारणपणे इ.स.पू. २३२ च्या सुमारास तो राजगादीवर आला असावा.  हा ‘श्रीमुख’चा अपभ्रंश वाटतो. याच नावाचा उल्लेख कधी शिशुक, तर कधी सिंधुक,’ ‘शिप्रक’  शिशुक्रोध असाही येतो. मौर्य सत्तेस उतरती कळा लागली बघून त्याने आपला राज्यविस्तार केला. त्याचे राज्य कोकण, पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकापर्यंत पसरलेले होते. शुंग राजांचे काही वंशज मध्य भारतात आणि दक्षिण बिहार मध्ये तग धरून होते त्यांचे सामर्थ्यही सिमुकाने नष्ट करून टाकले. पुराणांनुसर त्याने २३ वर्षे राज्य केले.
त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी रथिक व भोज या दोन जमातींनी मदत केली. त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून शुंगाची सत्ता संपुष्टात आणली व सातवाहनांचे राज्य स्थापित केले. काही तज्ज्ञांच्या मते अमरावतीजवळ असलेल्या गुंटूर जिल्ह्यात धरणीकोटा हे त्यांचे सुरुवातीचे राजधानीचे शहर होते. मात्र, कालांतराने औरंगाबाद येथील प्रतिष्ठान (आताचे पैठण) हे राजधानीचे शहर बनले. नाणेघाट येथील लेण्यांमध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुकने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून ’दक्षिणापथपति’ ही पदवी धारण केली होती. सिमुक  राजाने पैठण-नेवासे (मराठवाडा) प्रांत व्यापून तेथून उत्तरेला नाशिक आणि दक्षिणेला वाई-कऱ्हाड या भागांत आपला अंमल बसवला आणि सातवाहन घराण्याच्या साम्राज्यवर्धनाला सुरुवात झाली.

सिमुक सातवाहन राजा होण्याच्या आधी स्वतंत्र होऊन आपल्या नावाची नाणी पाडली असे म्हणतात. ही नाणी औरंगाबाद, नेवासे या ठिकाणी मिळाली आहेत. त्याने तांब्यापासून बनविलेली नाणी प्रचलित केली. सिमुकने आपल्या काळात अनेक जैन, बौद्ध मंदिरे बांधली.
सिमुकाला सातकर्णी नावाचा महापराक्रमी मुलगा तर कृष्ण नावाचा भाऊ होता. त्याने संपूर्ण महाराष्ट्र व आंध्रातील काही प्रदेश जिंकून घेतला म्हणून त्याचा 'दक्षिणापथपती' असा गौरवाने उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. आंध्र प्रदेशावर आक्रमण करणारा हा पहिलाच सातवाहन राजा असल्याने पुराणकारांनी त्याला आंध्र असे संबोधले आहे. सिमुकाची ' राया सिमुक ' अशी नाणी हैद्राबाद जवळील करीमनगर येथे मिळालेली आहेत. सिमुखाचा उल्लेख नाणेघाटातील प्रतीमालेखात ' राया शिमुक सातवाहनो श्रीमतो ' म्हणजे ' प्रसिद्ध राजा शिमुक सातवाहन ' असा येतो. ही नाणेघाट येथील लेणी सिमुकाची सून असलेल्या नागणिका हिने बांधून घेतली. नाणेघाटात या सर्व राजांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत आणि त्याच्या खाली त्यांची नावे दिलेली आहेत. तिथे याचा उल्लेख ‘सिमुक सातवाहनो’ असा आलेला आहे. या राजाने खुप मोठा पराक्रम गाजवला हे नाणेघाटातील लेखावरून कळून येते. नायनिका ही एका शूर, वीर व अजिंक्य राजाची स्नुषा होती असे वर्णन नाणेघाटात आलेले आहे. या लेखाचा बराच भाग हा उडाला आहे, तो जर मिळाला असता तर कदाचित या सिमुकाबद्दल अधिक माहिती मिळू शकली असती. पुराणात सुद्धा याच सिमुकापासून वंशावळ सुरु झाल्याचे दिसून येते. सिमुकानंतर काही वेळ श्री सातकर्णी मोठा होईपर्यंत सिमुकाचा भाऊ कृष्ण याने सत्ता सांभाळली होती. या कृष्णाचा उल्लेख हा नाशिकच्या लेण्यात आढळतो तो म्हणजे ‘सातवाहनकुले कन्हे राजिनि’. सातवाहन कुळात कृष्ण नावाचा राजा राज्य करत असताना समण नावाच्या एका माणसाने हे लेणे कोरले असा त्याचा अर्थ.
सातवाहन कण्व राजांचे सामंत होते. नंतर कण्व वंशातील शेवटचा राजा सुसर्मन ला सिमुक सातवाहन यांनी हरवले व स्वतःला स्वतंत्र घोषित केले. या सिमुक सातवाहन यांनाच सातवाहन वंशाचा मूळ पुरुष मानले जाते. यांनीच सातवाहन साम्राज्याची म्हणजेच महाराष्ट्राची स्थापना केली.
सिमुख सातवाहन यांनी दक्षिण भारतातील अनेक छोटे छोटे प्रांत जिंकले त्यात अपरांतक (कोकण), गोमंतक (गोवा), अश्मक (पैठणच्या आसपासचा प्रदेश), विदर्भ, नासिक्य (नाशिक), कान्हादेश (जळगाव, धुळे, नंदुरबार) कुंतलदेश ( कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव) तर हे सर्व प्रांत जिंकून सिमुख सातवाहन यांनी आपल्या साम्राज्यात सामील करून घेतले व या सर्व प्रांतांना मिळून महाराष्ट्र हे नाव दिले.
सिमुक सातवाहनांनी स्वतःला स्वतंत्र घोषित करून सार्वभौम राज्यकारभार चालू केल्यानंतर प्रतिष्ठानपुरी म्हणजे सध्याच्या पैठण ला मुख्य राजधानी बनवले व जीर्णनगर म्हणजे सध्याच्या जुन्नर ला उपराजधानी बनवले.

कृष्ण सातवाहन :-

सिमुकाच्या निधनाच्या वेळी त्याचा पुत्र प्रथम सातकर्णी हा अल्पवयस्क असल्यामुळे सिमुकाचा भाऊ कृष्ण हा गादीवर आला. त्याच्या अमात्याने नासिकजवळच्या ‘पांडवलेण्यां’तील एक लेणे कोरवून ते बौद्घ भिक्षूंना अर्पण केले, असे तेथील कोरीव लेखावरून कळते. या लेखात कृष्णाचा निर्देश ‘सातवाहन कुलातील कृष्ण राजा राज्य करीत असता’ असा केला असल्याने तो सातवाहन राजाचा पुत्र नसून बहुधा तिसऱ्या पिढीतील त्यांचा वंशज असावा.
कृष्णानंतर प्रथम सातकर्णी गादीवर आला. पुराणांत याला कृष्णाचा पुत्र म्हटले आहे; तथापि नाणेघाटात सिमुक, सातकर्णी, त्याची राणी नागनिका, तिचे पुत्र वगैरेंचे पुतळे कोरले होते; पण त्यांमध्ये कृष्णाचा पुतळा नव्हता. त्यावरून सातकर्णी हा सिमुकाचा पुत्र असावा. काही ठिकाणी कृष्णाचा उल्लेख ‘कण्ह‘ असा ही येतो. या राजाचे कोणतेही नाणे आज उपलब्ध नाही.काही अभ्यासकांच्या मते कृष्ण सातवाहनाचा कार्यकाळ फक्त दोन वर्ष होता, परंतु बहुतेक तज्ज्ञांच्या मते इ.स. पुर्व १९४ ते इ.स. पुर्व १८५ असा असावा. 

राजा सातकर्णी :-

       कृष्णा नंतर सिमुकपुत्र सिरी सातकणी किंवा श्री सातकर्णी हा सातवाहन सम्राट झाला. महाराष्ट्रातील महारथी त्रणकयिराच्या कन्ये सोबत सातकर्णीचा विवाह झाल्याने त्याचा प्रभाव खूपच वाढला होता. नाणेघाटातील लेखावरून सातकर्णी हा बलाढ्य व पराक्रमी राजा असल्याचे दिसते. सातवाहन कुलात सम्राटपद प्रात करून घेणारा हा पहिला महाराजा होय. 
त्याचे राज्य कोकण, नाशिक, खानदेश, वऱ्हाड, नागपूर, भंडारा येथ पर्यंत पसरले होते. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशातील सांची येथे सापडलेला शिलालेख हा सातकर्णीचा मुकादम असलेल्या वासिष्ठीपुत्र आनंद याने कोरलेला असून त्यात तो स्वतःचा उल्लेख 'राजा श्री सातकर्णीचा आवेशनिक' असा करतो. यावरून सातकर्णीचा अंमल हा मध्यप्रदेशापर्यंत पसरला होता असे दिसते. सातकर्णीने नर्मदा नदीच्या उत्तरेस आपल्या राज्याचा विस्तार केला. सांचीच्या तोरणावर त्याचा नामनिर्देश आहे.
बॅक्ट्रीयन आणि पर्थियन राज्य

          या वेळी उत्तरेत राजसत्ता ढिली झाली होती. डेमिट्रियस या बॅक्ट्रियाच्या ग्रीक राजाने अयोध्येपर्यंत आपली ठाणी वसविली होती. आणि सर्वत्र बौद्धधर्मातील अहिंसा तत्त्व प्रबळ झालेले असल्यामुळे त्याला कोणीच प्रतिकार करीत नव्हता. मगधसम्राट बौद्धधर्मनिष्ठ असल्यामुळे व त्यांनाही शस्त्रविजयापेक्षा धम्मविजयच श्रेष्ठ वाटत असल्यामुळे सर्व उत्तर भारत निर्वीर झाला होता. आणि महाराष्ट्रात श्री सातकर्णी, कलिंगात खारवेल व मगधात पुष्यमित्र हे कर्तेपुरुष निर्माण झाले नसते तर सर्व भारत यवनांनी - ग्रीकांनी आक्रमिला असता. या सर्वात सातकर्णीने आघाडी मारून उत्तरेत चाल केली व पश्चिम माळवा, अनूप - ( नर्मदेचे खोरे) आणि विदर्भ आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले. हे प्रदेश त्याने घेतले ते मौर्यसाम्राज्यातून. पण यावेळी मौर्य अगदी निष्प्रभ झाले होते. तेव्हा अयोध्येपर्यंत आलेल्या यवनांनी सहज गिळंकृत केले असते. सातकर्णीने ते घेतले म्हणूनच वाचले.

कलिंगराज खारवेल
 या वेळी खारवेल हा एक अत्यंत प्रबळ राजा कलिंगाधिपती झाला होता. अशोकाच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी चेदीवंशातील महामेघवाहन या पुरुषाने मौर्य साम्राज्याचे जू झुगारून देऊन कलिंग प्रदेश स्वतंत्र केला होता. खारखेल हा त्याचाच पुत्र किंवा नातू होय. 
खारवेल ( कल्पना चित्र )
खारवेलाचे राज्य

उदयगिरी गुंफा प्रस्तरलेख

भुवनेश्वराजवळील उदयगिरीवर हाथीगुंफानामक लेण्यात याच्या पराक्रमाचा दीर्घ शिलालेख आहे. त्यावरून असे दिसते की याने मगध साम्राज्यावर तीन वेळा स्वारी केली होती आणि एका स्वारीत मौर्यसम्राटाला पायाशी लोळवून तेथून अपार लूट कलिंगाला नेली होती. दुसऱ्या स्वारीचे कारण डेमिट्रियस हे होते. मौर्य- सम्राट बृहद्रथ हा त्याचा मुळीच प्रतिकार करीना. तेव्हा तो पाटलीपुत्रावर चाल करून येणार असा रंग दिसू लागला. म्हणून खारवेलानेच आधी चढाई केली. काही पंडितांचे मत असे की या स्वारीत त्याने डेमिट्रियसचा पराभव करून त्याला सिंधूपार पिटाळून लावले. दुसरे मत असे की डेमिट्रियसच्या स्वतःच्या बॅक्ट्रियाच्या राज्यातच शुक्रेडायटीम या प्रतापी पुरुषाने बंड केल्यामुळे त्याला घाईने परत जावे लागले. आणि खारवेलाच्या भीतीने तो पळून गेला असे श्रेय खारवेलाला उगीचच मिळाले. हा राजकीय पट पाहताना आपण एवढेच ध्यानात घ्यावयाचे की अशोकाने अहिंसा व धम्मविजय यांच्यापायी, चंद्रगुप्त मौर्याने उभारलेली समर्थ व कार्यक्षम राज्ययंत्रणा ढिली केली आणि लोकांतही बौद्धधर्माचा प्रसार केला. त्यामुळे मौर्यसाम्राज्य-राजे - आणि लोकही दुबळे होऊन गेले होते, आणि ते सर्वांचे भक्ष्य बनले होते. प्रतिकार असा तेथे कोणी करीतच नव्हता. त्यामुळे वायव्येकडून येणाऱ्या यवन आक्रमकांना पाटलीपुत्रापर्यंत सहज घुसता आले. पण त्याच वेळी सातकर्णी व खारवेल हे उदयास आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

महाराष्ट्रावर स्वारी
 खारवेल हा मोठा प्रतापी व महत्त्वाकांक्षी पुरुष होता. मगधाची लूट केल्यानंतर त्याने आपली दृष्टी सातवाहन साम्राज्याकडे वळविली आणि मूषिकनगरापर्यंत एक प्रचंड सेना धाडली. हे नगर कोणाच्या मते वैनगंगेच्या तर कोणाच्या मते कृष्णेच्या तीरी आहे. याच वेळी खारवेलाला फार मोठा जय मिळाला असे हाथीगुंफेच्या लेखात वर्णन आहे. पण पंडितांच्या मते तसे काही झाल्याचे दिसत नाही.तेव्हा पौनी परिसरात मोठे युद्ध होऊन सातकर्णीने खारवेलचा पराभव केला असे काही तज्ज्ञ मत मांडतात. पुढील वर्षी वऱ्हाड, खानदेश व अहमदनगर या प्रदेशांवर खारवेलाने स्वारी केली, तेव्हा मात्र त्यास मोठा जय मिळाला हे सर्वमान्य आहे. दुसऱ्या स्वारीच्या वेळी प्रत्यक्षात खारवेलाने सातकर्णीशी युद्ध टाळून त्याच्या रठीक व भोजिक या मांडलिकांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला. मात्र दोन्ही आक्रमणात त्याला सातकर्णीचा पराभव करता आला नाही. खारवेल हा जैनधर्मी होता. पण एकतर तो धर्मसहिष्णू होता आणि दुसरे म्हणजे त्या धर्मातील अहिंसा तत्त्व त्याने राजकारणापासून दूर ठेविले होते; म्हणूनच त्याला एवढे पराक्रम करून यवन आक्रमणाला पायबंद घालता आला.


अश्वमेधकर्ता
 श्री सातकर्णीच्या साम्राज्यावर खारवेलाचे दोनदा आक्रमण झाले तरी त्याने ते तत्काळ मोडून काढले, असे दिसते. कारण त्याने आपल्या अकरा वर्षांच्या लहानशा कारकीदींत ( इ. पू. १९४ ते इ. पू. १८५ ) राज्यावर आल्यावर दक्षिणापथाचे बरेच भाग जिंकून घेतले आणि या दिग्विजयार्थ नंतर दोन अश्वमेध यज्ञ देखील केले. या सोबतच एक राजसूय यज्ञ आणि अनेक श्रौतयाग करून हजारो गाई, अनेक अश्व, गज, वस्त्रे, कार्षपण ( नाणी) आणि धान्याच्या राशी यज्ञातील ब्राह्मणांना व यज्ञ सेवकांना दान दिल्याचे नाणेघाट येथील शिलालेखात म्हटले आहे. दोनदा अश्वमेध यज्ञ केला आणि एकदा राजसूय यज्ञ केला. हे यज्ञ व अग्न्याधेय, अन्वारंभणीय, गवामयन, आप्तोर्याम, अंगिरसामयन, छंदोग - पवमान, अतिरात्र, दशरात्र, त्रयोदशरात्र इ. त्याने जे इतर अनेक यज्ञ केले, त्यांवरून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार करूनच त्याने साम्राज्य–विस्तार केला हे उघड आहे. अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून त्याने आपले व त्याची पत्नी असलेल्या नागनिकेचे चांदीचे जोड नाणे चलनात आणले होते. त्यावर अश्वमेधाच्या आश्र्वाची प्रतिमा आहे. या सोबतच त्याची इतरही अनेक नाणी चलनात होती. त्यात चांदी, तांबे, शिसे, पोटिन या धातूंचा वापर केला गेलेला होता. या नाण्यांवर अश्व, गज, वृषभ आणि शार्दुल आदींच्या आकृत्या होत्या.
       दीर्घकालपर्यंत महाराष्ट्रात बौद्धवर्चस्व प्रस्थापित झाले होते. सातवाहनांनी ते नष्ट करून विजीगिषू, विश्वविजयी, साम्राज्यकांक्षी वैदिक धर्माचा पुनरुद्धार केला हे त्यांचे फार मोठे कार्य होय. श्री सातकर्णी याची राणी नायनिका अथवा नागनिका हिने जुन्नरजवळील नाणेघाटात जो मोठा लेख कोरविला आहे, त्यावरून सातवाहन हे वैदिकधर्मीय व हिंदु परंपरेचे अभिमानी होते हेच दिसून येते. त्या लेखात इन्द्र, संकर्षण, वासुदेव यांना प्रारंभी नमन आहे. नंतर यम, वरुण, कुबेर, वासव यांना नमन आहे. वर ज्या यज्ञांचा उल्लेख केला आहे त्यांत प्रत्येक वेळी ब्राह्मणांना किती गायी, अश्व व धन दक्षिणा दिली ते नमूद केलेले आहे. यावरून याविषयी संशयाला जागा कोठे राहात नाही.
       यासोबतच राजा सातकर्णी पासून सातवाहन हे वंशनाम नाहीसे होऊन सातकर्णी हेच वंशनाम रूढ झाले. नंतर आलेल्या राजांनी आपल्या नावापुढे सातकर्णी हे वंशनाम लावल्याचे दिसते. उदा. कौशिकीपुत्र सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठीपुत्र सातकर्णी, कुंभ सातकर्णी, विजय सातकर्णी, वगैरे. एकंदरीतच सातकर्णी हा सातवाहन कुळातील एक महत्तम व पराक्रमी राजा होता हे नक्की. सातकर्णीला वेदिश्री आणि शक्तिश्री असे दोन पुत्र होते. पुराणांत यांच्या ऐवजी पूर्णोत्संग आणि स्कंदस्तंभी अशी नावे आढळतात.
पुराणांनुसार सातकर्णी नंतर राजा पूर्णोत्संग गादीवर आला. तर काहींच्या मते सातकर्णीचा पुत्र वेदश्री हा राजा झाला, मात्र अल्पवयीन आल्याने त्याची आई नागनीका ही राज्यकारभार चालवत होती.  वेदिश्रीनंतर अनेक राजांनी राज्य केले. त्यांची नावे व शासनाची वर्षे पुराणांत दिली आहेत; पण ती सर्वस्वी विश्वसनीय नाहीत. या वंशातील आठवा राजा आपीलक याचे मात्र एक तांब्याचे नाणे छत्तीसगढमध्ये महानदीच्या काठी बालपूर येथे सापडले आहे.

 नायनिका :-

       सातकर्णीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा वेदश्री तथा सतश्री (अथवा शक्ति श्री) हा गादीवर आला मात्र तो अल्पवयीन आल्याने त्याची आई नागनिका हीच राज्यकारभार बघत होती असे दिसते. अनेक विद्वानांच्या मते मात्र वेदिश्री हा अल्पवयस्क असल्यामुळे नागनिका काही काळ राज्यकारभार पाहात होती असे म्हटले आहे; पण ते बरोबर दिसत नाही. नाणेघाटातील लेखात तिचे वर्णन ‘महिना-महिना उपोषण करणारी, गृहतापसी, ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणारी, दीक्षा, व्रत आणि यज्ञ यांच्या अनुष्ठानांत निपुण’ असे केले आहे. त्यावरून ती त्या काळी आपले जीवन धार्मिक वृत्तीने घालवीत होती, यात संशय नाही. त्या काळी तिचा ज्येष्ठ पुत्र वेदिश्री हा राज्य करीत होता. त्याचे वर्णन नाणेघाटातील लेखात ‘दक्षिणापथपति’असे केले आहे.
सातकर्णीची राणी देवी नायनिका हिची म. म. मिराशी हे भारतवर्षातील महनीय स्त्रियांत गणना करतात. महाराष्ट्रात त्या वेळी अनेक नागसरदार होते. ते महारठी ही पदवी धारण करीत. सिमुक सातवाहनानेच त्यांना या पदव्या दिल्या होत्या. अशाच एका अंगिकुलवर्धन वंशातील महारठी त्रणकयिरो नावाच्या सरदाराची नायनिका ही कन्या होती.

नागनिका अशी दिसत असली पाहिजे

    नाणेघाट येथील लेणे हे नागनिका हिनेच कोरलेले आहे. त्यात कोरलेल्या लेखात नागनिका ही सातकर्णी राजाची भार्या असून, स्कंदश्री याची माता होती, वेदिश्री, सतिश्री, हकुश्री या तिच्या पुत्रांचे पुतळेही नाणेघाटात आहेत. सातकर्णी मृत्यू पावला त्या वेळी कुमार वेदश्री हा लहान होता. त्यावेळी आपल्या पित्याच्या साह्याने देवी नायनिकेने साम्राज्याचा कारभार उत्तम चालविला. पतिनिधनानंतर तापसीव्रताने ती राहात असे, असे शिलालेखात तिने वर्णन आहे. तापसीव्रताने राहून राज्यकारभार करणाऱ्या या महाराणीचे वर्णन वाचून देवी अहल्याबाईचे वाचकांना सहज स्मरण होईल. तिला 'नागवरदायिनी ', ' मासोपवासिनी’, ‘गृहतापसी’, ‘चरितब्रह्मचर्या’, अशी विशेषणे लावलेली आहेत. यावरून तिचा दिनक्रम हा वैराग्यपूर्ण होता असे दिसते. पतीच्या निधनानंतर तिने राज्यशकट यशस्वीपणे चालवला. यावरून तत्कालीन स्त्रियांना राजकारणात तसेच समाजात श्रेष्ठ स्थान असल्याचे दिसून येते. इतकेच नाही तर नाणेघाटातील लेण्यांमध्ये तिच्या पतीच्या सातकर्णीच्या प्रतिमेच्या आधी नागनिकेची प्रतिमा कोरण्यात आलेली दिसते. सातवाहन घराण्यातील तिचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट करण्यासाठी तिची प्रतिमा राजा सिमुक याच्या नंतर खोदलेली आहे. नागनिका ही अत्यंत जिद्दीची व मानी स्त्री असल्याचे तिच्या नाणेघाटातील लेखावरून दिसते. याच लेण्यात तिच्या दोन पुत्रांच्या प्रतीमांनंतर तिच्या पित्याची प्रतिमा कोरलेली आहे. सातवाहन कुळात आपल्या पित्याची प्रतिमा कोरणारी ही इतिहासातील बहुदा पहिलीच राणी असावी. पित्याच्या प्रतीमेखाली ‘अंगियकुलवर्धन सागरवलयांकित पृथ्वीवरील श्रेष्ठ वीर’ असे बिरूद ही कोरलेले आहे. यावरून तिचा दराराही स्पष्ट होण्यास मदत होते.
तिच्या पती प्रमाणेच नागनिका सुद्धा धार्मिक वृत्तीची होती. ती स्वतःहा यज्ञदीक्षादिकात निष्णात असून तिने आपल्या पती सोबत अश्वमेध, राजसूय, गवामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसामन, अंगिरसातिरात्र, शततिरात्र अश्या अनेक यज्ञांमध्ये उत्साहाने सहभाग घेतलेला होता.
अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून सातकर्णीचे व नागनिकेचे जोड नाणे चलनात होते. त्याच्या एकाबाजूला ' रजो सिरी सतकनिस ' तर दुसऱ्या बाजूला ‘नागनिका’ अशी नावे स्पष्ट कोरलेली आहेत.
तिचा पुत्र वेदश्री राज्यकारभार करण्यालायक झाल्यावर तिने आपले आयुष्य व्रतवैकाल्यांना वाहून घेतल्याचे व एका तपस्वीनी सारखे जीवन जगल्याचे दिसते. तिला पतीनिधनासमावेत पुत्र निधनाचे दुःख सुद्धा सहन करावे लागले. कारण तिचा जेष्ठपुत्र भायल व कनिष्ठ पुत्र सातवाहन हे अल्पयीन असतानाच मरण पावले होते. तिने आपल्या नावाची नाणी देखील छापली होती. नाण्यांवर आपली प्रतिमा उमटवून ती नाणी चलनात आणणारी नागनिका की प्रथम भारतीय महिला होती. यावरून नागनिका भारतातील पहिली महिला राज्यकर्ती आहे असे म्हणावे लागेल.
   वेदश्री सारकर्णी अल्पायुष्यी ठरला. मात्र काही तज्ज्ञांच्या मते त्याचा उत्तराधिकारी सतश्री सातवाहन सत्तेत आला तर काही तज्ज्ञांच्या मते पूर्णोत्संग(पौर्णमास ) सातवाहन सिंहासनाधीश झाला. चौथा सातवाहन कोणीही असो, एक नक्की कि त्याच्याच कारकीर्दीत अंतिम मौर्य शासक ब्रुहद्रथ याचा वध करुन पुष्यमित्र शृंग मगधच्या सत्तेत आला. मत्स्यपुराणानुसार स्कंधस्तंभ  हा पाचवा सातवाहन शासक होता, मात्र बहुतेक तज्ज्ञ त्याला काल्पनिक मानतात.            
पुष्यमित्र शुंग
 सम्राट श्री सातकर्णी इ. पू. १८५ या वर्षी मृत्यू पावला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८४ साली मगधात राज्यक्रान्ती झाली. अशोकानंतरचे राजे दुबळे व प्रतिकारशून्य असल्याने साम्राज्याची वाताहात होत होती आणि सर्वत्र बजबज माजून प्रजेत अत्यंत असंतोष निर्माण झाला होता. यावनी आक्रमणाची भीती तर सारखी वाढतच होती. अशा वेळी पुष्यमित्राचा उदय झाला. तो मौर्यसम्राट बृहद्रथ याचा सेनापती होता. एकदा संचलनाचे वेळी उठावणी करून त्याने बृहद्रथाला ठार मारले व आपण सम्राटपद धारण करून आपल्या शुंगवंशाची स्थापना केली. या पुष्यमित्राने खुद्द पाटलीपुत्रातच अश्वमेध केला व दुबळ्या, निवृत्तिप्रधान बौद्धधर्माला बाजूस सारून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. या शुंगवंशाने इ. पू. १८४ ते इ. पू. ७२ असे ११२ वर्षे राज्य केले.

विदिशेपर्यंत
 पहिल्या सातकर्णीनंतर तेवढाच पराक्रमी सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी हा होय. त्याने इ. स. १६६ पासून इ. पू. १११ पर्यंत म्हणजे ५६ वर्षे राज्य केले; आणि सातवाहन साम्राज्याला दृढता व स्थैर्य प्राप्त करून दिले. पहिल्या सातकर्णीने पश्चिम माळवा जिंकला होता. याने पूर्व माळवाही जिंकला. विदिशेला (भिलसा ) एका शिलालेखात सातकर्णीचा उल्लेख आहे तो याचाच असावा असे पंडितांचे मत आहे. साची येथील महाद्वारावर सातकर्णीच्या पदरी असलेला शिल्पकार वसिष्ठीपुत्र आनंद याचा दानविषयक एक लेख कोरलेला आहे. त्यावरून तेथपर्यंत सातवाहनसत्ता स्थिर झाली होती असे दिसून येईल. डॉ. केतकरांच्या मते, प्रयागजवळच्या उत्खननात सापडलेल्या मुद्रा- शिक्के- या सातवाहनांच्या व त्यांच्या अधिकाऱ्यांच्या आहेत. तसे असले तर सातवाहनसाम्राज्य तेथपर्यंत पोचले होते असा अर्थ होईल. पण त्या मुद्रा वाकाटकांच्या आहेत असे डॉ. जयस्वाल यांचे मत आहे. (प्राचीन महाराष्ट्र, भाग १ ला, डॉ. केतकर, पृ. ३९९.)
वीर विक्रम ?
 कालकाचार्यांच्या कथेतला वीर विक्रम म्हणजे हा दुसरा सातकर्णीच होय असे गाथासप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकर यांचे मत आहे. कालक हे जैन आचार्य. ते धर्मप्रसारार्थ उज्जयिनीस आले असता तेथील राजा गर्दभिल्ल तथा गंधर्वसेन याने त्यांची बहीण सरस्वती हिचे हरण केले. तिची सुटका करण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्यावर आचार्यांनी शकराजांना उज्जयिनीवर स्वारी करण्यासाठी निमंत्रण दिले. ( भारतीयांनी हीच परंपरा आजपर्यंत अखंडपणे चालविली आहे. ) त्याप्रमाणे बोलनघाटातून येऊन शक उज्जयिनीवर कोसळून पडले, त्यांनी गंधर्वसेनाचा नाश करून सरस्वतीची सुटका केली. पण काम झाल्यावर ते परत जाईनात. त्यांनी माळव्याचे राज्य बळकावले व प्रजेवर ते अनन्वित अत्याचार करू लागले. कालकाचार्यांचीही ते अप्रतिष्ठा करू लागले. तेव्हा त्यांचा उच्छेद करण्याच्या हेतूने सातवाहन राजाची मदत मागण्यासाठी आचार्य प्रतिष्ठानास आले. सातवाहन राजाने त्यांची मागणी मान्य केली व सेना घेऊन तो माळव्यात गेला व त्याने मालवगणांच्या मदतीने शकांना पिटाळून लावले. हा सातवाहन राजा म्हणजे दुसरा सातकर्णी होय, असे जोगळेकर म्हणतात. त्यांच्या मते मूळ कथेतला वीर विक्रम तो हाच होय. मात्र संवतकर्ता जो विक्रमादित्य त्याच्याशी ते याचा संबंध जोडीत नाहीत.
 सातकर्णीने कालकाचार्यांच्या विनंतीवरून माळव्यात जाऊन शकांचा उच्छेद केला या घटनेला थोडा विश्वसनीय पुरावा सध्या उपलब्ध झाला आहे. जैनांचे पर्युषणपर्व श्रावणात असे ते कालकाचार्यांनी बदलून भाद्रपदात आणले असा इतिहास आहे. 'युग प्रधानस्वरूप ' या जैन ग्रंथाप्रमाणे हे कालकाचार्य इ. स. पू. १७१च्या सुमारास होऊन गेले. दुसऱ्या सातकर्णीचा हाच काळ आहे. आणि जैन कालकाचार्यकथेप्रमाणे हेच आचार्य प्रतिष्ठानला सातवाहन राजाकडे आले होते. यामुळे जोगळेकरांचे अनुमान खरे असावे असे वाटते.
 पहिल्या सातकर्णीविषयीही जोगळेकरांनी थोडी निराळी माहिती दिली आहे. त्यांच्या मते पुष्यमित्राने मिनँडर - मिलिंद - या बौद्धधर्मी ग्रीक राजाचा पराभव केला व त्याला सीमापार केले, त्या वेळी त्याला या सातकर्णनि साह्य केले होते. पहिल्या सातकर्णीचा मृत्यू इ. पू. १८५ या साली झाला असे वर दिले आहे. पुष्यमित्राचा उदय त्यानंतर एक वर्षाने म्हणजे इ. पू. १८४ साली झाला व त्याने मिनेडरचा उच्छेद इ. पू. १७५ साली केला असे एक मत आहे. तेथपर्यंत सातकर्णी जिवंत होता असे जोगळेकर मानतात.
कुलव्रत
 जोगळेकरांचे मत मान्य केले तर परकी आक्रमकांचा उच्छेद करणे हे सातवाहन कुलाचे प्रारंभापासूनच व्रत होते असे दिसून येईल. पहिल्या सातकर्णीने वर सांगितल्याप्रमाणे माळव्यात जाऊन शकांचे निर्दाळण केले आणि इ. सनाच्या पहिल्या शतकात गौतमीपुत्र सातकर्णीने महाराष्ट्रातील शकसत्ता नाश करून टाकिली हे तर सर्वमान्यच आहे. सातवाहनकुलाचे हे वैभव अपूर्व होय यात शंका नाही.
       पुराणाप्रमाणे दुसरा सातकर्णीनंतर लंबोधर सातवाहन सत्तेत आला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र अपिलक सत्तेत आला. लंबोधर आणि आठवा सातवाहन अपीलक या दोघांच्या मधला काळ थोडा उतरणीचा काळ मानला गेला आहे. अपीलकनंतर कुंतळ सातकर्णी हा महत्वाचा शासक होता. कामसुत्राची रचना करणार्या वात्सायनाने कुंतल सातकर्णीविषयी लिहीले आहे कि त्याने आपल्या बोटांची कात्रीसारखा वापर केल्यामुळे त्याच्या प्रहारामुळे त्याची पट्टराणी मलयवतीचा मृत्यु झाला. काव्यमिंमासा या काव्यात राजेश्वरने कुंतल सातकर्णीविषयी लिहीले आहे कि त्याने आपल्या सर्व राण्यांना आदेश दिला कि त्यांनी फक्त प्राकृत भाषेचाच वापर केला पाहिजे.

राजा हाल सातवाहन

       सातवाहन राजे कलेचे भोक्ते होते. सतरावा सातवाहन राजा हाल याने अनेक उत्तम कवींना राजाश्रय दिला होता. त्यांच्या राजकाळात  कार्यकाळ ( इ.स.पुर्व २० ते इ.स. पुर्व २४ )  साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते.  गुणाढ्याचे “कथा सरित्सागर”, वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. उत्तम अश्या कवींकडून एक कोटी गाथा हाल राजाने संकलित केल्या व त्यातील निवडक सातशे ओव्यांचा महाराष्ट्री प्राकृतात ‘सत्तसई’ किंवा ‘गाथासप्तशती’ नावाचा ग्रंथ तयार केला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रमाणित आद्यग्रंथ म्हणावा लागेल. शृंगाररस पूर्ण या ग्रंथामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णन पहावयास मिळते.  या ग्रंथामुळेच त्याचे नाव संस्कृत व प्राकृत साहित्यात अजरामर झाले आहे. गाथासप्तशती हा तत्कालीन सामाजिक स्थिती व संस्कृती यावर प्रकाश टाकणारा एकमेव महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. सोबतच महाराष्ट्रात निर्माण झालेला हा पहिलाच ग्रंथ म्हणूनही याचे महत्त्व आहे. हालाच्या दरबारातील गुणाढ्य या मंत्र्याने पैशाची भाषेत ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ लिहिला तसेच संस्कृत व्याकरणावर आधारित ‘कातंत्र’ हा ग्रंथ लिहिणारा सर्ववर्मा हादेखील हाला च्या दरबारात होता! हाल सातवाहनाने आपल्या बलाढ्य आरमारातून श्रीलंकेवर स्वारी करून तेथील राजकन्या लिलावती याच्याशी कसा विवाह केला याचे कल्पनारम्य चित्रण “लीलावई” या काव्यग्रंथात आले आहे.

    राजा हाल याचे आजपर्यंत एकही नाणे अथवा शिलालेख उपलब्ध झालेला नाही. मात्र त्याच्या शृंगारप्रधान काव्यामुळे तो साहित्य क्षेत्रात अजरामर झालेला दिसतो. पुरणाशिवाय त्याचा उल्लेख आपल्याला लीलावई, देशिनामाला, सरस्वतीकंठाभरण अश्या अनेक नंतर लिहिल्या गेलेल्या ग्रंथात आढळतो. या ग्रंथांमध्ये हाल चे साम्राज्य संपूर्ण दक्षिण भारतात पसरल्याचे म्हंटले आहे मात्र आजपर्यंत हे सिद्ध करणारा पुरावा मिळालेला नाही. सोबतच हे सर्व ग्रंथ समकालीन नसल्याने व अनेक ग्रंथ हे दंतकथांवर आधारित असल्याने त्यांना इतिहास म्हणून स्थान देता येत नाही.
   गाथासप्तशती सोबतच धवल नावाचा काव्यसंग्रहही यानेच रचला असे समजले जाते. या ग्रंथांमधून त्याला ' प्रतिष्ठान ' चा राजा असे म्हटले आहे. त्याची कारकीर्द, त्याच्या लढाया, राज्यशासन या इतर गोष्टींची जास्त माहिती आज उपलब्ध नाही. त्यामुळे राजा हाल सातवाहनाचे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व अद्यापही स्पश्ट झालेले नाही.

गाथासप्तशती - महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य 

      हाल सातवाहन (इ.स.१ ले शतक,पूर्वार्ध) या राजाला प्राकृत भाषा प्रिय होत्या.तो प्राकृत कवींचा आश्रयदाता होता.राजसभेतील कवींच्या सहकार्याने हालाने या लोकगाथा गोळा केल्या आणि त्यांचा कोश केला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्री प्राकृतात सिद्ध झालेला हा आद्य ग्रंथ होय. हालसातवाहनाने ७०० गाथांचा कोश केला.पुढे जयवल्लभ नावाच्या टीकाकाराने आणखी ३०० गाथा गोळा करून या कोशात भर घातली. या सर्व १००० गाथा स. आ.जोगळेकर संपादित सप्तशतीत आहेत. या गाथा ग्रामीण तसेच नागरी भागांतील कवींनी २००० वर्षांपूर्वी रचल्या.रचनाकारांची नांवे अज्ञात आहेत. 
सत्त सताइं कईवच्छलेण कोडिअ मज्झाअरैम्मि ।
हालेण विरईआइं सालंकाराणँ गाहाणम् ॥
       जमलेल्या एक कोटी गाथांमधून सर्वोत्कृष्ट, अलंकाराने नटलेल्या सातशे गाथा निवडून हालाने हा ग्रंथ रचला असा अर्थ या वरील गाथेचा किंवा ओवीचा होतो. या कोटी गाथा त्याने का जमविल्या व कशा जमवल्या असतील हे त्यालाच ठावूक. पण त्याबद्दल एक दंतकथा नंतर लिहिलेल्या अनेक टीकांमधून सापडते. हालाला विद्वत्तेचे भयंकर आकर्षण होते. त्याची एक चंद्रलेखा नावाची पट्टराणी होती. तिच्या समवेत तो एकदा जलक्रिडा करत असताना त्याने राणीच्या अंगावर पाणी उडवले. ते बघून राणीने त्याला संस्कृतमधे पाणी न उडविण्याची विनंती केली त्यात तिने मोदकै: हा समास वापरला होता. त्याचा अर्थ न कळून हालाने तिच्या समोर मोदक आणून हजर केले. ते बघून राणीने इतर राण्यांच्या समोर हालाचा उपहास केला. रागावून हालाने सरस्वतीची आराधना केली व ती प्रसन्न झाल्यावर तिच्याकडे जो वर मागितला तो भन्नाट होता. त्यात त्याने स्वत:च्या उपहासाचा बदला तर घेतलाच पण अशी परिस्थिती परत कोणावर ओढवू नये याचीही काळजी घेतली. त्याने वर मागितला “ माझे सर्व प्रजाजन हे कवी व सुशिक्षित होऊ देत” देवीचाच वर असल्यामुळे एक कोटी का दहा कोटी कवी त्याच्या राज्यात निर्माण झाले. त्यांच्यासाठी हालाने राज्यात दवंडी पेटवून त्यांना कविता लिहायचे आव्हान केले व त्यासाठी मानधनही जाहीर केले. त्यामुळे या एक कोटी गाथा जमा झाल्या. त्या वाचून हालाने त्यातील उत्कृष्ट अशा सातशे निवडल्या. अर्थात सगळ्यांनाच काहीना काहीतरी बक्षिस देण्यात आले. ही दंतकथा सोडल्यास हालाने त्याला संस्कृत व्याकरण शिकवण्यासाठी दोन थोर शिक्षकांची शिकवणी लावली होती व त्याने राज्यात दवंडी पेटवून काव्य सादर करण्याचे आवाहन केले होते हे सत्य आहे. त्या शिक्षकांची नावे आपल्याला माहीत असतील. एक होता गुणाढ्य तर दुसरा होता शर्ववर्मा. शर्ववर्म्याने हे काम सहा महिन्यात संपविल्यामुळे त्याला कच्छची सुभेदारी बक्षिस देण्यात आली असा उल्लेख कथासरित्सागरात आला आहे. जर तुम्ही या सर्व गाथा वाचल्यात तर तुम्हाला अजून एका काव्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही ते म्हणजे जगप्रसिद्ध “मेघदूत”. या गाथांमधील अनेक कल्पनांचा उल्लेख आपल्याला मेघदूतात आढळेल.
इतिहासात अनेक देश विदेशात राजांनी, सम्राटांनी आपल्या पदरी भाट बाळगले होते. राजकवी, राजगायक, राज जोतीष, राज नर्तिका इत्यादी पदे निर्माणकरून कलांना राजाश्रय देण्यात येई. पण सर्वसामांन्यांच्या कलेला किंवा प्रतिभेला उत्तेजन देण्यासाठी हालाने जी युक्ती वापरली त्याचे हे उदाहरण एकमेवच असेल. सातव्या शतकाच्या पहिल्या भागात होऊन गेलेला महाकवि बाणभट्ट आपल्याला माहितीच आहे. त्याच्या हर्षचरित्रात या गाथांचा उल्लेख केलेला आहे तो मोठ्या कौतूकाने...

अविनाशिनमग्राम्यमकरोत्सातवाहन: ।
विशुद्धजातिभि: कोशं रत्नेरिव सुभाषितै:

याचा स्वैर अर्थ होतो –ज्या प्रमाणे एखादा राजा आपल्या प्रजेकडून न संपणारा निधी गोळा करतो त्याप्रमाणे सातवाहन राजाने अत्यंत विशूद्ध जातिछंदात रचलेली ही सुभाषिते गोळा केली व त्यांचा एक कोश रचला. किती खरे आहे... एकवेळ राजाचा खजिना संपेल, त्याच्या खजिन्यातील रत्ने संपतील पण या सुभाषितांच्या रत्नांचा खजिना या जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे. हे आपल्या येथे (भारतात) अनेक ग्रंथांच्या बाबतीत सिद्धही झाले आहे.
         सर्वसामान्यांकडून जमा झालेल्या या गाथांची भाषाही त्यामुळे सर्वसामान्यांचीच आहे. त्या काळात महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत ही भाषा बोलली जात असे. संस्कृत व आत्ताची मराठी यामधे कुठेतरी ही भाषा आहे असे मानायला जागा आहे. पण एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे प्राकृत ही अत्यंत गोड व मधाळ भाषा आहे. उदाहराणार्थ वर दिलेली किंवा कुठलीही गाथा आपण जर वाचून बघितली तर आपल्याला आढळेल की आपल्या वाणीतील कठोर शब्द, हेल नाहीसे झाले आहेत. उत्तरेतील हिंदी व ब्रज भाषा यामधेही हाच फरक आहे. दुर्दैवाने/सुदैवाने मराठीने संस्कृतची कास धरली म्हणून तीही तिच्या सारखी आघातप्रिय, कठोर भाषा झाली. जर मराठीने प्राकृताची कास धरुन आपला प्रवास केला असता तर मराठी आज आहे त्याहूनही गोड झाली असती. अर्थात त्यात एक तोटा झाला असता तो म्हणजे मराठी शिव्यांचा दरारा लोप पावला असता. :-)
.     ख्रि.पू. दुसर्‍या शतकात पतंजलिच्या प्रेरणेने पुष्यमित्र शुंग व पहिला सातकर्णी यांनी बौद्ध पण परकीय मिनॅंडरचा पराभव केला. ख्रि.पू. पहिल्या शतकात दुसर्‍या सातकर्णीने माळव्यात प्रस्थापित झालेल्या शकांचा नाश केला. याच काळात प्रबळ झालेल्या सातवाहनांनी प्राकृत भाषेचा पुरस्कार केला व महाराष्ट्री प्राकृत उदयास आली असे म्हणायला हरकत नाही. या भाषेला महाराष्ट्री प्राकृत म्हणायचे मुख्य कारण म्हणजे यात बरेच देशी शब्द आहेत जे इतर ठिकाणी बोलण्यात येणार्‍या प्राकृतात सापडत नाहीत.
श्री जोगळेकरांच्या मते प्राकृतात प्रचलित असलेल्या शब्दांचे तीन गट पडतात. एक म्हणजे संस्कृतातून तसेच्या तसे उचलले शब्द, दुसरा म्हणजे काही सुधारणा होऊन आलेले शब्द. या सुधारणा म्हणजे बहुतेककरून जोडाक्षरे काढून शब्दोच्चारात सुलभता आणणे या होत्या. तिसरा गट आहे देशी शब्दांचा. याचा संस्कृतशी काहीही संबंध नाही. अर्थात काळाच्या ओघात दोन्हीही भाषांचा एकामेकांवर प्रभाव पडत गेला त्यांच्यात दुसर्‍या भाषेचे शब्द विपूलतेने आढळू लागले. हॉलमधे आपण आपल्या बायकोला हाका मारतो व शयनगृहात हाका मारतो यात जो फरक आहे तो संस्कृत व प्राकृतात आहे. एक व्यवहार, परक्यांशी संवाद साधण्यासाठी वापरली जायची तेव्हा ती रोखठोकच असायची. दुसरी आपल्या लोकात प्रेमाने संवाद साधाण्यासाठी त्यामुळे ती मृदू, कमी त्रास देणारी इ... अशीच असणार. प्राकृत भाषेबद्दल वाक्पतिराजाने काय म्हटले आहे ते बघुया –

णमवत्थ-दंसणं संनिवेस-सिसिराओ बंध-रिद्धैओ ।
अविरलमिणमो आभुवन-बंध्मिह णवर पययम्मी ॥

सयलाओ इमं वाया विसन्ती एत्तो य णेन्ति वायाओ ।
एन्ति समुद्दंचिय णेन्ति सायराओच्चिय जलाइं ॥

हरिस विसेसो वियसवओ य मऊलावओ य अच्छीण ।
इह बहि-हुजो अन्तो-मुहो य हिययस्स विप्फुरई॥

“अभिनव आशय, समृद्ध रचना आणि मृदु शब्दमाधुर्य या बाबतीत प्राकृत सर्व भाषेत श्रेष्ठ आहे. जल हे सागरापासून निर्माण होते व ते सागरालाच जाऊन मिळते त्या प्रमाणे सर्व भाषा प्राकृतातूनच निर्माण झाल्या आहेत व प्राकृतातच विलीन होतात. प्राकृतातून मनाला अनिर्वचनीय आनंद होतो, आनंदाने नेत्र विकसित होतात (विस्फारले जातात) व तृप्तीने मुकुलित ही होतात (मिटतात).”
     संस्कृत ही अल्पसंख्य आर्यांची भाषा.ती बहुजन समाजाची भाषा कधीच नव्हती.धार्मिक कृत्यांसाठी संस्कृतचा वापर करणार्‍या आर्यांची घरगुती व्यावहारिक भाषा प्राकृतच होती. तसे नसते तर 'यज्ञदीक्षा पुरी होईपर्यंत प्राकृतात बोलूं नये' असा दण्डक सूत्रकारांनी घातला नसता. 
या गाथा सम्राट हाल याच्या राज्याच्या अनेक विभागातून आल्या असल्यामुळे यात त्या राज्यांच्या विवीध भागातील लोकजीवनाचे प्रतिबंब पडते. त्या भागात कसली झाडे आहेत, कुठल्या नद्या आहेत, घरे कशी आहेत, कुठले पर्वत आहेत, तेथे रहाणार्‍या जनतेची वस्त्रे, तेथे मिळणारी विविध प्रकारची मद्ये, त्याचा परिणाम, एवढेच काय काही कॉकटेल्सचीही माहिती मिळते. 
दोन हजार वर्षांपूर्वींच्या आपल्या पूर्वजांची राहाणी,रीतिरिवाज,आर्थिकस्थिती,उद्योगधंदे,नैतिक कल्पना, कामजीवन अशा सर्वांगांचे गाथांच्या माध्यमातून संशोधन करूनही प्रस्तावना लिहिली आहे. बहुतेक गाथा ग्रामीण भागातील असून शृंगार हा त्यांचा मुख्य विषय असला तरी त्या ग्राम्य नाहीत. त्यांचा आस्वाद नागर विदग्धतेनेच घ्यायला हवा. तरच त्यांतील काव्य, अलंकार,प्रतिमा, संकेत इ.चे आकलन होऊ शकेल.
त्या काळी नैतिक बंधने शिथिल होती.तरुण तरुणींच्या विवाह्पूर्व संकेत भेटी होत.भेटीचे निरोप पोचविण्यासाठी दूती असे.आई, आत्या, यांची या प्रकाराला मूक संमती असे.बालविवाहाची पद्धती नव्हती.सुनेच्या छळाचा उल्लेख एकाही गाथेत नाही.मुलगा प्रवासाला गेल्यावर एका आईच्या तोंडी गाथा अहे,: "आता या सुनेची मला काळजी घ्यायला हवी. कारण माझ्या मुलाची ही जीवन संजीवनी आहे."
अशाच एका सासूला वाकून नमस्कार करताना सुनेच्या हातातील दोन कंकणे गळून पडली. तेव्हा सासूचे डोळे पाणावले.(पतिविरहामुळे सून कृश झाली होती.
प्रत्येक गाथा दोन ओळींची असून ती आर्या अथवा गीती वृत्तात आहे.त्या चालीत म्हणाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पण प्राकृत भाषा अपरिचित असल्याने आपल्याला ते जमणे अवघड आहे. 
       या गाथा हालाने संकलित केल्या इ.स. २१ ते ४५ साली. म्हणजे जवळ जवळ दोन हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रात सामान्य जनतेचे आयुष्य कसे होते, कपडे कसे होते, त्यांची करमणूकीची साधने कुठली होती, त्या काळी कुठले पक्षी प्राणी होते अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आहे. एखाद्या राज्यातील सगळ्या प्रदेशातील माहिती गोळा करण्याची ही युक्ती हालाने वापरली त्यामुळे आपल्याला त्या काळात वावरता येते..
बहुतेक गाथा ग्रामीण भागातील असून शृंगार हा त्यांचा मुख्य विषय असला तरी त्या ग्राम्य नाहीत. त्यांचा आस्वाद नागर विदग्धतेनेच घ्यायला हवा. तरच त्यांतील काव्य, अलंकार,प्रतिमा, संकेत इ.चे आकलन होऊ शकेल. "चोलीके पीछे क्या है ।" या प्रकारची ही कल्पनाशून्य छचोर गाणी नव्हेत.
गाथा आर्यावृत्तात आहेत. त्या चालीत म्हणाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.पण प्राकृत भाषा अपरिचित असल्याने आपल्याला ते जमणे अवघड आहे.

........
१.अमिअं पाउअ कव्वं,पढिउं सोउं अ, जे ण आणंती।
कामस्स तत्ततन्तिं, कुणन्ति ते कहं ण लज्जन्ति ?।
..
संस्कृत छाया: अमॄतं प्राकृत काव्यं,पठितुं श्रोतुं च ये न जानन्ति ।
कामस्य तत्त्वचिन्तां,कुर्वन्ति ते कथं न लज्जन्ति ।
...
अमृतासारखे प्राकृत काव्य वाचणे किंवा ऐकणे ज्यांना माहीत नाही आणि जे कामशास्त्रातील तत्त्वांची (शुष्क) चर्चा मात्र करीत असतात त्या (संस्कृत पंडितांना ) लाज कशी वाटत नाही?
......
२.साळीचे शेत पिकून पांढरे झाले आहे.(ते शेतकरी कापतील व आपले भेटीचे एकान्त स्थळ नष्ट होईल) म्हणून मान खाली घालून का रडतेस? नटीने मुखाला हरितालाचा रंग लावून सज्ज व्हावे त्या प्रमाणे तागाचे शेत (पिवळ्या धमक फ़ुलांनी )नटले आहे, ते पाहा.
...
३. अण्ण महिला पसंगं, दे देव करेसु अम्ह दइअस्स ।
पुरिसा एक्कंतरसा, ण हु दोसगुणे विआणन्ति।
...
अन्य महिलाप्रससंगं, हे देव कुर्व स्माकं दयितस्य।
पुरुषा एकान्तरसा, न खलु दोषगुणौ विजानन्ति।
.....
देवा, माझ्या पतीचा संबंध अन्य स्त्रियांशी येऊं दे.(म्हणजे तरी त्याला माझे गुण समजतील.) एकनिष्ठ पुरुषांना (आपल्या पत्नीचे) गुण समजत नाहीत आणि दोषही उमजत नाहीत.
.......
४.धूम्ररहित अग्निगोलां सारखे लकाकणारे आपल्या नवपरिणित श्यामल पत्नीचे स्तन पाहून शेतकयाने माघमहिन्यात(ऐन हिवाळ्यात) आपली ऊबदार पांघरुणे विकून बैल खरेदी केला. (ऊबेची सोय झाली आहे. शेतीसाठी बैल हवा आहे.शेतकरी गरीब आहे.)
 .....
५. जेत्ति अमेत्ता रच्छा, णिअम्ब!कह तेत्तिओ ण जाओसि?
जं छिपाइ गुरुगण लजिओ,सरन्तो वि सो सुहओ ।
...(.एक युवती म्हणते)...नितंबांनो, तुम्ही रस्त्याच्या रुंदीच्या प्रमाणानुसार विस्तृत का झाला नाही?
तसे झालां असतां तर, वडिलांच्या सान्निध्यामुळे संकोच वाटल्याने मुद्दाम दुरून जाणार्‍या प्रियकराला मला स्पर्श तरी करता आला असता!
           महाराष्ट्री प्राकृतातील  ण ने सुरू होणारे शब्द आणि शब्दांतील अंतरात येणारे स्वर वेगळे वाटतात, त्यामुळे या भाषेने उत्सुकता वाढते. पुस्तकात प्रत्येक गाथा, तिची संस्कृत छाया, अर्थ आणि विवरण आहे. एखाद्या शब्दाच्या संस्कृत आणि प्राकृत रूपांची तुलना केल्यास प्राकृत रूपामध्ये संस्कृत रूपातील बरीचशी व्यंजने फेकून देऊन अधिकतर केवळ स्वर टिकवून ठेवण्याकडे कल दिसतो.
स्वर जरी सारखे असले, तरी  त्याप्रमाणे व्यंजने बदललेली दिसतात. पण कुठल्याही व्यंजनाच्या जागी इतर कुठलेही व्यंजन कसेही वापरायचे, असे नाही. काही विशिष्ट व्यंजनांच्या जागी काही विशिष्ट व्यंजने वापरायची. जसे श आणि ष चा स होतो. म्हणजे जिथे जिथे स येईल तिथे तिथे आपण श किंवा ष घालून बघू. प घालून बघणार नाही. जसे पहिल्या गाथेत ठ चा ढ झालेला दिसतो आहे. म्हणजे ट-वर्गातल्या दुसर्‍या व्यंजनाच्या जागी चौथे व्यंजन वापरण्याची पद्धत दिसते असे म्हणता येईल. (अर्थात त्यासाठी एकच उदाहरण पुरेसे नाही.) हे सर्व वर्गांच्या बाबतीत म्हणजे क-वर्ग, च-वर्ग वगैरे, दिसते का ते तपासायचे. याचाच अर्थ कुठल्या व्यंजनाच्या जागी कुठलं व्यंजन येणार हे कळलं की, अर्थातली संदिग्धता बर्‍याच अंशी निघून जाईल.
या व्यंजन काढून टाकणे आणि व्यंजन बदलणे प्रकारांत काहीतरी समानता निश्चितच आहे. क,च,ट,त,प वर्गांतील केवळ तिसरी व चौथी व्यंजनेच वापरली जातात की काय, प्रथम २ व्यंजने वापरली जातच नाहीत की काय! परंतू प आणि क वापरले जात असल्याचे दिसत आहे. तसेच काही अनुनासिके वापरली जात असून इतर गायब दिसतात.
जर मराठी माहीत नसेल तर अशा संदिग्ध परिस्थितीत संदर्भावरून शब्दाची संस्कृतच्छाया ठरवता येते. एखादा संदर्भ संदिग्ध असेल, पण भाषेचे साहित्य विस्तृत असेल, तर दुसरा, असंदिग्ध वापर सापडतो. संस्कृत आणि प्राकृत भाषेतील साम्यस्थळे, शब्दांची अपभ्रष्ट रूपे आणि अपभ्रंशाचे नियम याबद्दल लक्ष्मीधरकृत 'षड्भाषाचंद्रिका' हे पुस्तक उपयुक्त आहे. षड्भाषाचंद्रिकेप्रमाणे अपभ्रष्ट भाषांमध्ये - महाराष्ट्री, प्राच्य, शौरसेनी, मागधी, (अर्धमागधी, ),अवंती,(बहालिकी),शाकारी, चांडाळी,शाबरी,(अभिरी, औधुरी),टक्की, नागर, उपनागर, पैशाची इ. अनेक भाषांचा समावेश होतो. अभ्यासकांसाठी ही सहज मिळू शकणारी दोन्ही पुस्तके मुळातूनच वाचण्याजोगी आहेत.
 त्या प्राकृत भाषा लुप्त झाल्या, त्यांच्या थोड्याफार जवळची (मराठीच्या मानाने जवळची) संस्कृत भाषा अजून शिकली जाते म्हणून संस्कृतच्छायेचा आपल्याला फार उपयोग होतो. त्या मर्यादित दृष्टीने संस्कृतच्छाया वापरावी. मग प्रसिद्ध व्याकरणग्रंथ (मोग्गलान, कच्छायन, प्राकृतप्रकाश वगैरे) अपभ्रंशाचे नियम सांगून प्राकृत भाषांचे व्याकरण का करतात? उदा मोग्गलानचा पालीसाठी नियम :
व-नंतर आलेला किंवा शब्दाच्या सुरुवातीचा ऋ=>उ. उदाहरण
वृषभ=>उसभ
काही जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ प्राकृत भाषांमध्ये लिहिले गेले आहेत. पुढे त्या प्रचलित बोली राहिलेल्या नव्हत्या, पण संस्कृत प्रचलित सुशिक्षित भाषा राहिलेली होती. त्यामुळे मुळातच पालीचे वगैरे व्याकरण लिहिण्यापेक्षा अपभ्रंशाचे नियम लिहिणे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी झाले असेल. 
      गाथा रोचक आहेत. यावरून एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे ह्या गाथा दोन हजार वर्षांपूर्वीच्या. कामसूत्र इ. स. दोनशे मधले. खजुराहो इ. स. ९५० ते इ. स. १०५० मधले. म्हणजे अकराव्या शतकापर्यंततरी भारतीय संस्कृतीमध्ये आत्ताच्या पाश्चात्य जगतात आहे तितकी (किंवा अधिक?) लैंगिक मोकळीकता होती असे मानायला हरकत नाही. आणि हा प्रवास असाच चालू राहिला असता तर आत्ताच्या भारतीय समाजाचे चित्र बरेच वेगळे दिसले असते. प्रश्न असा की नंतरच्या हजारेक वर्षांमध्ये असे काय झाले की आपण लैंगिकतेच्या बाबतीत घूमजाव करून अगदी प्रागैतिहासिक काळात गेलो?
डोक्यावर पदर घेणे, सायंकाळनंतर घराबाहेर न पडणे या सारखी अनेक बंधने याच काळात आली असणार.  मुसलमानांनी आपल्या (हिंदू) संस्कृतीतले गुण उचलले नाहीत उलट (हिंदुत्ववादी) हिंदूंनी मात्र इस्लाम मधील अवगुण बरोबर उचलले. गाथा वाचता त्याकाळातील स्त्रीपुरुष संबंधांबाबत काहीसा उदार (आजच्या तुलनेने) दृष्टीकोन दिसतो. परंतु एक अज्ञ शंका अशीही येते की हे काव्य त्या काळातील 'ग्राम्य' काव्य तर नव्हते? (वात्स्यायनाची कामसूत्रे संस्कृत भाषेतील अभिजात साहित्यकृती म्हणता येईल का?) 

    गाथेची सुरवात शंकराला नमन करून केली आहे..
पसुवईणो रोसारूणपडिमासंकन्तगोरिमुहन्दम ।
गहिअग्धापङ्ग्कअं विअ संझासलिलंजलिं णमह ॥
मावळत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पशूपतीने ओंजळीत पाणी घेतले आहे. आकाशातील तांबड्या रंगाच्या उधळणीमुळे त्याच्या हातातील हे पाणी लाल दिसत आहे अशा पशूपतीला नमन असो.
देवाला नमन करून झाल्यावर लगेचच दुसर्‍या गाथेमधे ज्या भाषेत या गाथा तयार झाल्या आहेत त्या प्राकृत भाषेचे उपकार स्मरून तिची थोरवी गायली आहे. सामान्य माणसांनी या गाथा रचल्या आहेत याचे अजून एक उदाहरण. खेडेगावातील सामान्य माणूस सभ्यतेचे अवडंबर न माजवता स्वत:च्या गोष्टींची थोरवी सांगताना दुसर्‍याचा कमीपणा दाखविल्याशिवाय रहात नाही. तसेच येथेही दिसून येते –
अमिअं पाउअकव्वं पढिउं सोउं अजे ण आणन्ति।
कामस्य तत्त्तन्तिं कुणन्ति ते कहॅंण लज्जन्ति ?॥
अमृतासारखे प्राकृत काव्य वाचणे किंवा त्याचे श्रवण करणे ज्यांना माहीत नाही
ते कामशास्त्रातील तत्वांची मात्र जोरजोरात चर्चा करत असतात. असे करताना त्यांना लाज कशी वाटत नाही ? थोडक्यात काव्यशास्त्राचा आनंद घेण्यासाठी प्राकृत साहित्याचा उपभोग घ्यायचा सोडून हे पंडीत कामशास्त्राकडे वळतात याची त्यांना लाज का वाटत नाही ? (हे कामशास्त्रांवरचे ग्रंथ रचणार्‍यांना उद्देशून असावे) कामक्रिडे इतकाच आनंद प्राकृत साहित्य देते हे यांना ठावूक नाही का ?
त्या काळी म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी समाजाचे सामाजिक नियम शृंगार व नितीमत्तेच्या बाबतीत बरेच सैल असावेत. आपल्याला याची उदाहरणे बर्‍याच नंतरच्या काळातील देवळातील कामशिल्पे देतातच. याही गाथेत त्या सैल असलेल्या बंधनांचे प्रतिबिंब आपल्याला पडलेले दिसेल. उदाहरणार्थ स्त्रियांनी पुरषांची त्याच्या बायकोवरून केलेली चेष्टा इ.इ. किंवा विवाहीत स्त्रीने लग्नानंतर आवडत्या पुरूषाबरोबर संबंध ठेवणे...मैत्री ठेवणे या सगळ्या गोष्टींना मर्यादेपर्यंत मान्यता होती असे दिसते.
    मद्यपान तर सर्वचजण करत असत. स्त्रियांना गोड मद्य आवडत असे तर पुरषांना कडक.. अशा अनेक गोष्टींवर या सामान्य जनतेने लिहिलेल्या गाथा प्रकाश टाकतात. आता आपण गाथेतून काय माहीती मिळते ते बघू... जेथे अत्यंत चांगल्या गाथा किंवा मजेदार गाथांचा उल्लेख असेल त्या गाथाही अर्थासहित येथे द्यायचा प्रयत्न करेन.
    या प्रकारच्या गाथा जेव्हा नंतरच्या काळात टिकाकारांच्या हातात पडल्या तेव्हा हालाच्या या कल्पनेची टिंगल टवाळी झाली. काही ज्ञानी मंडळी या गाथांना अश्लील, साहित्यिक दर्जा नसलेली कलाकृती मानायला लागली. अर्थात ते तसे नाही हे आपल्या पूढे वाचल्यावर लक्षात येईलच..............

त्या काळात कुठल्या नद्या होत्या किंवा वहात होत्या ते अगोदर बघूया. नद्या या कुठल्याही संस्कृतीच्या जीवनदायी असतात त्यामुळे त्यांचा उल्लेख महत्वाचा ठरतो.
गिरिनदी : या नदीचा उल्लेख गिरिणई म्हणून आला आहे.
गोदावरी या नदीचा उल्लेख गोआअरी, गोदा, गोला, गोलाई इत्यादी नावाने झालेला दिसतो. सातवाहनांना या नदीचे महत्व वाटत होते यात काही आश्चर्य नाही कारण त्यांची राजधानीच या नदीच्या किनारी वसलेली होती. या नदीकिनारी नाशीकच्या डोंगराळ भागात सिंहाची वस्ती आहे असेही उल्लेख सापडतात. तापी व नर्मदा नदीचाही उल्लेख काही गाथांमधे सापडतो. एका गाथेमधे मुरला नावाच्या नदीचा उल्लेख सापडतो पण ती कुठे होती याचा पत्ता लागत नाही. यमुनेचाही ओझरता उल्लेख सापडतो.
नदी म्हटली की नदी किनार्‍यावर फिरायला जाणारे प्रियकर प्रेयसी आपल्याला बर्‍याच कथा कादंबर्‍यात आढळतात. येथेही ते दोघे गोदावरी काठी फिरायला गेले आहेत व तेथे जे झाले त्याचा त्यांना कधीही विसर पडणार नाही...काय झाले असावे बरे....

गोलाविसमोआरच्छलेण अप्पा उरम्मि से मुक्को ।
अणुअम्पाणिद्दोसं तेण वि सा आढमुवऊढा ॥

गोदावरीचे पात्र ओलांडताना बिचारीची त्रेधातिरपीट उडाली. उतारावर घसरताना सावरण्याच्या निमित्ताने तिने त्याच्या छातीवर भार टाकला. तिची ती त्रेधातिरपीट उडालेली बघून केवळ अनुकंपेने त्याने तिला हात दिला पण पुढे नाईलाजाने त्याने तिला तेथेच अलिंगन दिले. पण तो खरोखरच निर्दोष आहे.

गाथासप्तशतीमधे नद्यांप्रमाणे पर्वतांचेही उल्लेख सापडतात त्यात मंदर पर्वत (ज्याच्यावर कुबेराचे घर आहे), मलय पर्वत म्हणजे सह्याद्रीचा सगळ्यात दक्षिणेकडचा भाग, विंध्य पर्वताचा उल्लेख तर अनेक गाथांमधे आला आहे. एखाद्या पर्वताचा उल्लेख बघू. खालील गाथेत विंध्य पर्वताचा उल्लेख सापडतो-

सव्वत्थ दिसामुहपसॉरिएहिं अण्णोण्ण्कडअलग्गेहिं ।
छल्लिं व्व मुअइ विञ्झो मेहेहिं विसंघ्हडन्तेहिं ॥

या गाथेत पावसाळ्याअगोदर जे घनदाट ढग आकाशात गर्दी करतात त्याला या कवीने विंध्य पर्वताच्या वल्कलांची उपमा दिली आहे. नाणे घाटात पावसाळ्याच्या अगोदर दोन तीन दिवस जर तुम्ही बसलात तर खालून वर येणारे ढग त्या काळ्या कातळावर आपटून त्याचे तुकडे होताना आपल्याला दिसतील तसेच विंध्य पर्वतावर व एकामेकांवर आपटून त्या काळ्या मेघाचे तुकडे होत आहेत जणू विंध्य पर्वताने आपली वल्कले सोडून ठेवली आहेत. ( आणि तो नवीन वल्कले परिधान करायची तयारी करत आहे, नवीन हिरवळ, पालवी इत्यादी.....)
गाथासप्तशतीमधे वृक्षांचा उल्लेख बर्‍याच गाथेत आहे ते नैसर्गिकच म्हटले पाहिजे कारण तेथे रहाणार्‍या गिरिजनांनीही या उपक्रमला काव्ये पाठविली असणारच. अशोक, आंबा, एरंड, कदम्ब, कमळ, करंज, कवठ, काश (गवताचा एक प्रकार), कुटज, कुंद, कुरबक, कुसुम्ब, केतकी, कोसम्ब, खाजरी, गुंज, चंदन, जांभूळ, ताल-ताड, देवदार हा वृक्ष हिमालयात आढळतो. याचा उल्लेख बहुतेक सांकेतीक असावा. याशिवाय मोगरा, कडूनिंब,पळस, पाटल (हा आता आढळत नाही.) फलिणी, बकूळ, बेल, बोर, मधूक म्हणजे मोह, मरवा, मालती, वड, विषकंदली, वेळू म्हणजे बांबू, शिरीष, शेफालिका, हरिद्रा, हलाहल-म्हणजे विषारी वृक्ष अशा वृक्षांचा गाथासप्तशतीमधे उल्लेख सापडतात. याचा अर्थ दोन हजार वर्षापूर्वी ही झाडे येथे अस्तित्वात होती आणि ती अस्सल भारतीय म्हणून त्याला मान्यता द्यायला तज्ञांची हरकत नसावी. सध्याच्या मोनोकल्चरच्या जमान्यात खरे म्हणजे एखादे जंगल तयार करायचे असल्यास कोणती झाडे लावावीत याची ही यादीच हालाने आपल्याला दिली आहे. त्याचा उपयोग करणे आपल्या हातात आहे.
कदम्ब वृक्षाचा उल्लेख एका गाथेत कसा आला आहे ते बघुया –

तालूरममाउल्खुडिअकेसरो गिरिणईए पूरेण ।
दरबड्डउबुड्डणिबुड्डमहुअरो हीरइ कलम्बो ॥

याचा गर्भितार्थ श्री जोगळेकरांनी ओढून ताणून एका प्रेयसीने प्रियकराला भेटायच्या स्थळाबद्दल संकेत दिला आहे असा लावला आहे. पण मला तर याच्यात एका खेडेगावातील माणसाला नदीत कदम्बाची फांदी वाहताना दिसल्यावर सुचलेले एक भन्नाट काव्य दिसते. याचा अर्थ असा आहे – डोंगरातून वाहत आलेल्या नदीला पूर आला आहे. त्या पूरात अनेक फांद्या, झाडे वाहत आहेत पण एक फांदी कदम्बाची आहे ती लक्षात येण्याचे कारण म्हणजे त्याच्यावरील फुलांचे पराग तुटून गेले आहेत. त्या फुलांवर बसलेला भूंगा त्या फांदीबरोबर पाण्यात थोडा बुडतो व परत वरती येतो. (गटांगळ्या खातोय). याच्यातून इतर काय माहिती काढता येते ते बघूया – एक म्हणजे या प्रदेशातील नद्या डोंगरात वाहतात. त्यांना ज्या काळात कदम्बाच्या फुलांना पराग येतात त्या काळात पूर येतो. म्हणजे त्याच्या अगोदर काही दिवस पावसाळा चालू होतो. अजून एका वृक्षाचा, आंब्याचा उल्लेख बघू –

दिट्ठा चुआ, अग्घाइआ सुरा, दक्खिणाणिलो सहिओ ।
कज्जाइं व्विअ गरूआई मामि ! को वल्लहो कस्स ? ॥

घरातील जेष्ठ स्त्रीला एक गृहस्वामीनी म्हणते “ मामी ! ते लवकर परत यावेत म्हणून मी आम्रांकूराचे दर्शनही घेतले (पूजा असणार) व थोडेसे मद्यही घेतले. दक्षिणेकडून येणार्‍या वार्‍याची झुळूक अंगावर घेत मी येथे उभी आहे (दरवाज्यात वाट बघत) माझ्यापेक्षा त्यांना कामाचे महत्व जास्त वाटते.....कोण कोणाचा नाही....प्रियकर तर नाहीच नाही.....
गाथासप्तशतीतील पशूंपक्षांचा उल्लेखही या पशूंचा महाराष्ट्रातील वावर सिद्ध करतो. काही तज्ञांचे म्हणणे असे आहे की गाथासप्तशती ही उत्तरेकडे रचण्यात आली पण त्याकडे विशेष गांभिर्याने लक्ष द्यायची गरज नाही कारण एकतर ही हालाने संपादित केली व यातील नव्वद उल्लेख टक्के महाराष्ट्रातील आहेत. जे काही उल्लेख उत्तरेकडचे आहेत ते सांकेतीक आहेत म्हणजे उदाहरणार्थ “हिमालयाएवढा उंच”.
अच्छभल्लाची म्हणजे अस्वलाची त्याकाळात त्याच्या चरबीसाठी शिकार करत असावेत अशा प्रकारचा एक उल्लेख सापडतो. कमठ म्हणजे कासव, कण्हसार म्हणजे काळवीट, गवा, गाढव, गाय, बैल, चितळ, चित्ता, पाठीण नावाचा मोठा तळ्यातील मासा, माकड, मांजर, मुंगूस, हरिण, मेस-मेंढा (मेष), रण्णुंदर म्हणजे घूस, रानडुक्कर, रेडा, म्हैस, वाघ, शरभ या काल्पनिक प्राण्याचाही गाथेमधे उल्लेख आहे. याचे शरिर सिंहाचे तर तोंड हत्तीसारखे असते. याच्या प्रतिमा आपल्याला अनेक मंदिरावर सापडतील. या प्राण्यांबरोबर सिंह, हत्ती ( हे अर्थात कर्नाटक भागात असावेत). गायीच्या उल्लेखाचे एक उदाहरण घेऊ-

कहॅं सा णिव्वण्णिज्जइ जीअ जहा लोइअम्मि अंङ्गम्मि ।
दिट्ठी दुव्वलगाई व्व पङ्कपडिआ ण उत्तरइ ? ॥
अर्थ : चिखलात रुतलेल्या दुर्बल गाईला ज्या प्रमाणे चिखलात रुतलेल्या गाईला आपला पाय काढता येत नाही त्या प्रमाणे माझी अवस्था झाली आहे. तुझ्या एकेक अवयवांकडे माझी दृष्टी तेथेच अडकून पडते. मी त्यातच घायाळ होतो. मी तुझ्या संपूर्ण सौंदर्याचा आनंद कसा घेणार या काळजीने मला ग्रासले आहे.
या अर्थातून काय अनुमान काढता येते ते बघा – तेथे गावात गाई फसण्याएवढा चिखल होता. जनावरे सहसा चिखलात फसत नाहीत मग गाय फसली याचा अर्थ तिच्या मळलेल्या वाटेवर हा चिखल नव्याने आलेला दिसतोय. म्हणजेच त्या काळात तेथे रस्त्यांची बोंब दिसते. पण इतर गाथेत शहरातील रस्ते चांगले आहेत असा उल्लेख आढळतो याचा अर्थ हे खेडेगाव असावे. स्त्रिच्या सौंदर्याबद्दल काय अनुमान काढावे मला वाटते हे सांगायची आवश्यकता नाही.

आता त्या काळात कुठकुठले पक्षी होते ते बघूया. बरेचसे आत्ताही आहेतच. कावळ्याला बिचार्‍याला त्याही काळात आजच्यासारखाच माणसांचा दुस्वास सहन करावा लागत होता. एका गाथेत बाहेर अंगणात ठेवलेल्या अन्नावर झडप घालताना शेजारीच पडलेली फुटकी बांगडी बघून कावळा दचकतो असा उल्लेख आहे. तर ही खालची गाथा बघा -

परिहूएण बि दिअहं घरघरभमिरेण अण्णकज्जम्मि ।
चिरजीविएण इमिणा खविअह्मो दङ्ढकाएण ॥
याच्यावरून संस्कृत ओळी कशा तयार करता येतात त्यासाठी हे संस्कृतमधेही खाली देत आहे -
परिभूतनापि दिवसं गृहगृहभ्रमणशीलेनान्यकार्ये ।
चिरजीवितेनानेन क्षपिता: स्मो दग्धकायेन ॥

अर्थ: लोकांनी तिरस्कार केला व पुन्हां: पुन्हां: हाकलून लावले तरीही कावळा अन्नासाठी लोंचटासारखा पुन्हां: पुन्हां: घरोघर जातो व जळके जीवन चिरकाल जगतो. याच प्रमाणे (म्हातारी झालेली वेश्या म्हणते) वारंवार अपमान झाला तरी तो सोसून मला पोटासाठी दारोदार फिरावे लागते

पोपटाच्या रंगामुळे त्यांना पाचुची उपमा देताना हा अजून एक ग्रामकवी म्हणतो -

उअ पोम्मराअम्रगअसंवलिआ णहअलाओ ओअरइ ।
णहसिरिकण्ठब्भट्ठ व्व कण्ठिआ कीररिञ्छोली ॥
पहा पोपटांचा थवा आकाशातून झाडावर उतरत आहे. जणू आकाशाचा कंठा तुटून त्यातील पाचू व माणके ओघळत आहेत.... सुंदर...

इतर पक्षात पारवा, कोंबडा, जलरड्‌कुण-पाणकोंबडी, बलाआ म्हणजे बगळा, भ्रमराचा उल्लेख असलेली गाथाही अशीच श्रुंगारिक आहे -

भरिमो से गहिआहरधुअसीसपहोलिरालआउलिअम ।
वअणं परिमलतरलिअभमरालिपइण्णकमलं व।
अर्थ: मी तिचा ओठ माझ्या दातात धरल्यावर तो सोडविण्याच्या धडपडीत तिचे केस सैल झाले व ते तिच्या मुखावर ओघळले/पसरले. ते केस बघून वासाने धुंद झालेले भुंगे कमळाभोवती जमतात त्या दृष्याची मला आठवण आली. अजून मोर, सारिका-मैना यांचेही उल्लेख सापडतात.

पक्षांबरोबर किडे, व सरपटणारे प्राण्यांबद्दलही उल्लेख सापडतात. कोळी, झिल्ली म्हणजे रातकिडा, णिम्बईड म्हणजे कडू लिंबावरचा एक किडा, विच्छुअ, साप, सालूरी –बेडूक व हरिआल म्हनजे आत्ता दिसतो पक्षी नसून एक मुंग्या खाणारा छोटा प्राणी आहे. आपण झिल्लीच्या उल्लेखाची एक गाथा बघूया.  अदिवासी लोक आजही रातकीड्यला “झिली”म्हणतात. हे किडे पहिला पाऊस झाला कि मरून खाली पडतात. दोन हजार वर्षात या नावातील फक्त एक “ल” कमी झाला. रातकिड्यांच्या आवाजाला एक प्रकारचा ताल व किणकीण असते. हा आवाज म्हणजे नुसता कोरडा आक्रोश बस्स ! हाच शब्द त्याला योग्य आहे.

रोवन्ति व्व अरण्णे दूसहरइकिरणफंससंतत्ता ।
अइतारझिल्लिविरूएहिं पाअवा गिम्हमज्झन्हे ॥

अर्थ: उन्हाळा आहे. उन मी म्हणते आहे. त्या उन्हात तापलेले वृक्ष त्यांच्या वरील किटकांच्या कर्कश्य आवाजाच्या रुपाने जणू आक्रोश करत आहेत.

गाथासप्तशतीतील लोकजीवन आजच्या मावळातील कुठल्याही खेड्यातील लोकजीवनाप्रमाणे होते. सिप्पर म्हणजे छप्पर ही त्या काळी गवताने शाकारलेली असत. बांबूची बेटे विपूल होती. छोटी गावे होती तशी शहरेही होती असा उल्लेख आहे. कदम्बाची झाडे फुललेली असून ती विपूल आहेत. गावातून ओढे वाहत आहेत व देवळांचा सुकाळ आहे. घराची बांधणी आपण आत्ता बघतो तशीच आहे. खोल्या आहेत व त्याच्या भिंती कुडाच्या आहेत. घराच्या भिंती चित्रांनी सजवलेल्या आहेत. एका गाथेत तर गृहस्वामिनीने पति गावाला गेल्यावर दिवस मोजण्यासाठी खूणा केलेल्या आहेत.

ओहिदिअहागमासंकिरिहिं सहिआहि कुडुलिहिआओ ।
दोतिण्णि तहिं विअ चोरिआए रेहा पुसिज्जन्ति ॥

पतिने किती दिवसाने परत येणार याचे वचन दिलेले आहे. त्या वचनाप्रमाणे तेवढ्या रेघा भिंतीवर मारलेल्या आहेत. तेवढे दिवस उलटून जाणार हे लक्षात येताच तिच्या मैत्रिणींनी त्या रेषा तिच्या नकळत वाढविल्या. पण इकडे रेषा कमी केल्यामुळे आपला पति लवकर परत येईल या आशेने तिनेही त्यातील काही पुसून टाकल्या.
घरांना उंबरे आहेत. बर्‍याच घरांना ओसरी आहे ज्याला त्यावेळी अलिन्दक म्हणत. गोठ्याचे अनेक उल्लेख गाथामधे आलेले आहेत त्यावरून गोधनाचे महत्व लक्षात यावे. शेतातील घराला ओवालअ म्हणत. शयनगृह जे आतील भागात असे, त्याला अन्तेउर असे संबोधले आहे. पावसाळ्यात घरे गळत होती व ती दुरूस्त करायची कामे पुरुष करायचे. त्या काळी सामान साठवायचा लोभ नसावा कारण घरातील वस्तूंचा फारसा उल्लेख कुठल्याही कविंनी केलेला नाही. बसण्यासाठी गवतावर हरणाचे किंवा वाघाचे कातडे वापरत. शहरात मात्र पल्लंक (पलंग) वापरत. एका गाथेत पलंगाभोवती डासापासून संरक्षणासाठी गब्भहरण लावलेली आहे. मुसळे व सुपे प्रत्येक घरात आहेतच. पाणी साठविण्यासाठी मातीचे कुंभ वापरत असावेत तर शकूनासाठी धातूचे मंगलकलश अस्तित्वात होते. सिंदूर भरायची व कुंकू लावायची रीत त्याही काळी होती असे दिसते कारण हे ठेवण्याच्या डब्यांची वर्णने गाथेत आली आहेत. मद्य ठेवण्यासाठी स्फटिकपात्र व पिण्यासाठी चषक वापरत. घरात पुरूष स्त्रियांना मद्याचा आग्रह करत व चटूक नावाच्या लाकडी भांड्याचाही उल्लेख आहे. ते भिक्षा देण्यासाठी वापरत. रात्री प्रकाशासाठी तेलांच्या दिव्याचा वापर होई. यांना काचा नसत असे म्हणायचे कारण म्हणजे एका गाथेत दिव्याची ज्योत विरहिणीच्या अश्रूंनी विझते असा उल्लेख आहे. दिव्याची ज्योत हाताने विझवायची प्रथा होती क्वचितच फुंकरेने ती विझवत असत. काही काही दिवे तर तेल संपले तरीही पेटते रहात उदा...

द्ठ्ठूण तरूणसुरअं विविहविलासेहि करणसोहिल्लम ।
दीओ वि तग्गामणो गअं पि तेल्लं ण लक्खेइ ॥

तरूण युगुलांच्या विलासी रतिक्रिडा बघताना दिवा इतका तल्लीन झाला आहे की तेल संपले तरीही त्याला विझण्याचेही भान राहिले नाही.
गाथासप्तशतीतील नातीगोती काय होती त्यावर एक नजर टाकूयात कारण माणसांमधील नाती ही बर्‍याच वेळा माणसांपेक्षाही महत्वाची होतात.... घराचा कुटुंब प्रमूख गृहपती... गाथांमधे गृहपती शक्यतो बावळट दिसतो म्हणजे त्याची गृहस्वामिनीतरी त्याला बावळट समजते असे दिसते पण तो घरादाराचे संरक्षणाचे काम चोख बजावताना दिसतो. शेतीवाडीची कामेही मोठ्या तडफेने करतो पण बहुदा आजच्याप्रमाणे त्याचेही आपल्या बायकोपुढे काही चालत नाही असे दिसते. त्याच्याकडे तलवार असते व तो त्याचा वापर करायला मागेपुढे पहात नाही. एका गाथेत अशाच एका श्रीमंत गृहपतीच्या उनाड मुलाच्या वागणूकीबद्दल लिहिले आहे...हेही आजच्या सारखेच. ससूर-सासरा, देवर-दीर, सासू यांचा उल्लेख बरेच आहेत. गाथांमधील सासू प्रेमळ आहे. सुनेच्या दु:खाने ती अश्रू ढाळताना दिसते. सुनेच्या छळाचा कुठेही उल्लेख नाही. अत्ता-आत्या, पिउच्छा, माऊच्छा व मामि ही नाती म्हणजे घरातील जेष्ठ स्त्रिया असाव्यात. माआ, माइआ, माउआ म्हणजे आई. गाथांमधे सवतींचा उल्लेख अनेक वेळा आढळतो. दोन तीन लग्ने करायची पद्धत सर्रास असावी असे वाटते. सधन घरात तर होतीच होती.
सवतीमत्सराच्या हकीकती गाथांमधे आहेत. उदा. –

जो तीए अहरराओ रत्तिं उव्वासिओ पिअअमेण ।
सो व्विअ दीसइ गोसे सवत्तिणाणेसु संकन्तो ॥

तिच्या ओठांचा लाल रंग तिच्या पतिने रात्री स्वत:च्या ओठांनी पुसून घेतला. पण सकाळ झाल्यावर तिच्या सवतीच्या नजरेस हे पडल्यावर तो रंग तिच्या डोळ्यात प्रकट झाला. (तिचे डोळे रागाने आरक्त झाले.)
गाथासप्तशतीतील स्त्री कशी आहे तिची दिनचर्या कशी होती याबद्दल श्री जोगळेकरांनी गाथा धुंडाळून संशोधन केले आहे ते तसेच्या तसे येथे देण्याचा मोह मला आवरत नाही. गाथा वाचून त्यातून काय काय माहिती काढता येते त्याचा हा उत्तम नमुनाच आहे. –
“लग्नाच्यावेळी तिचे वय जाणते असे. तो काळ उलटल्यावर त्या विवाहासाठी अतूर होत. त्या सुशिक्षित आहेत व पतीला पत्रही लिहितात व त्याची वाचतात. लग्नानंतर तिच्या वागणूकीत गांभीर्य येते. रात्री जागरण झालेले असले तरीही कुलवधू पहाटे उठून कामाला लागते. उजाडण्यापूर्वी न उठणारी स्त्री नवर्‍याची पट्टराणी असली तरी सगळ्यांच्या निंदेस पात्र ठरते. झाडलोट झाल्यावर ती स्नान करते व स्वयंपाकाला लागते. पण माहेरी गेल्यावर मात्र ती उशीरा आंघोळ करते. ती स्वयंपाककलेत निपूण आहे व आल्यागेल्याला भिक्षा वाढते. स्वयंपाक झाल्यावर काकबली देते. शेतावर घरधन्याला व त्याच्या कामगारांना न्याहारी घेऊन जाते. ती सणाला नांगराची पूजा करते व जरूरी पडल्यास शेतात कामेही करते. दळण, कांडणही तिलाच बघावे लागते. दिवसभर कामे करून दुपारी जरा आडवे झाले की तिला टिकेला सामोरे जावे लागतेच. पति गावाला गेला असला की ती वेळ मिळाला की पतीची वाट बघत दारात उभी रहाते व तो आल्यावर त्याचे स्वागत करते. ती पतीच्या यशाने आनंदीत होते व त्याचा संसार आनंदाने करते. पतीचे चित्त बाहेर कुठे गुंतले असले तरीही ती क्रोध मनात ठेवताना दिसते. स्वत:च्या शिलाचे संरक्षण करण्यासाठी ती काहीही करू शकते. ती शेजारणीलाही सर्व प्रकारची मदत करताना दिसते. आपल्या कुटूंबाची विपन्नावस्था ती प्रकट होऊ देत नाही. गरीबीत आपले डोहाळेही मनातल्या मनात पूरवते. कुटुंबापुढे आपल्या सर्व हौसांवर ती पाणी सोडते. कुटूंब एकत्र ठेवण्यात तिचा मोठा सहभाग असतो. माहेरची ओढ असली तरी ती सासरचा अभिमान धरते. पती गावाला गेला असेल तर ती वेणी फेणी करत नाही, डोळ्यात काजळ घालत नाही किंवा तिला ते सुचत नाही. स्त्रियांना पुरेसे स्वातंत्र्य असे. एका गाथेत असे म्हटले आहे की ज्या घरात स्त्रिया मोकळ्या मनाने बोलतात, अकृत्रिमपणे वागतात, मोकळेपणाने हसू शकतात, निष्पापपणे वावरतात ती कुटुंबे धन्य होत !”
ही आहे दोन हजार वर्षापूर्वीची महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्त्री. तिच्याकडून केल्या जाणार्‍या व आत्ताच्या स्त्रिकडून केल्या जाणार्‍या अपेक्षांमधे फारसा फरक दिसत नाही. फक्त एकच फरक दुर्दैवाने पडलेला दिसतो तो म्हणजे त्या काळात बायकोला दारू पिऊन मारहाण केल्याचा उल्लेख सापडत नाही आणि सध्या ते आपल्याला सर्रास दिसते.

त्या काळात देवळांना अज्जाघर म्हणत व अज्जघराचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. ही देवळे छोटी असून त्याची पटांगणे मात्र मोठी असत. उतारूंची रहायची सोय या देवळात हमखास असे. आजही आपण ट्रेकला गेलो की हमखास देवळात झोपतो... मूर्ती गणपातीच्या, अज्जाच्या आहेत. काही गाथांमधे सतीच्या प्रथेचे उल्लेख आहेत. सती जाणे ही फार चांगली प्रथा आहे असे मानले जात नसावे. कारण चिता विझावी अशी इच्छा मनात धरणारी एक गाथा आहे –

विज्जाविज्जइ जलणो गहवइधूआइ वित्थअसिहो वि ।
अणुमरणघणालिङ्गणपिअअमसुहसिइज्जिरङ्गीए ॥

घरधन्याची मुलगी सती जाण्यासाठी चितेवर चढली. मरायच्या अगोदर तिने पतीच्या प्रेताला अलिंगन दिले. त्यातही झालेल्या सुखाने तिला घाम आला व ती चिता त्यात विझून गेली..... आता काय म्हणावे या गाथेला ? कोणी लिहिली असावी ही गाथा ?
गाथेतून त्याकाळी काय काय समजूती होत्या तेही कळून येते. बर्यारचशा समजूती आजही तशाच आहेत. शकून अपशकूनावर गाढ विश्वास आहे, देवाची प्रार्थना काहीतरी मिळविण्यासाठी केली जाते. स्वर्ग व नरक या कल्पना अस्तित्वात होत्या. चांगले वाईट व धर्म याबद्दलही काही गाथात लिहिलेले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दैव या कल्पनेवर (?) एका गाथेत दैवावर थोडाफार पण सुंदर प्रकाश टाकलेला दिसतो -

ज जं आलिहइ मणो आसावट्टीहि हिआफलअम्मि ।
तं तं बालो व्व विही णिहुअं हसिऊण पम्हुसइ ॥
अर्थ : माझ्या ह्र्दयाच्या पाटीवर मी आशेच्या कुंचल्यांनी मी स्वप्ने विविध रंगांनी रंगवली पण हाय ! दैवाने एका खट्याळ मुलाप्रमाणे खदाखदा हसत ती चित्रे निष्ठूरपणे एका क्षणात पुसून टाकली.
काय सुंदर कल्पना आहे बघा !

घरातील कोणी प्रवासाला निघाल्यास दरवाजात प्रस्थानकलश ठेवण्यात येई. त्यात पाणी, आंब्याची पाने व कमळ खोचण्यात येई. मोरांच्या पिसांनी एखद्याला संमोहित करता येते अशी श्रद्धा होती. नागाच्या फण्यावर रत्न असते अशी आज असणारी समजूत त्याही काळी होतीच... भूत संमंधावर व पूनर्जन्मावर विश्वास ठेवला जाई.
सातवाहनांच्या काळात किंवा गाथासप्तशतीच्या काळात वैदिक धर्माचे आचरण होत असे. नाणे घाटात असलेल्या शिलालेखात अनेक यज्ञांचा उल्लेख दिसतो तो त्यामुळेच. सातवाहन वैदिक धर्म पाळत पण ते भागवत धर्माचे अनुयायी होते. त्या काळात अग्नि, इंद्र, प्रजापति, रुद्र, वामन सूर्य व कृष्ण या देवांची पूजा होत असे. हे सर्व वैदिक संस्कृतीने निर्माण केलेले आहेत.

गाथासप्तशतीच्या काळात लोक काय खात असावेत ? ते त्यावेळी त्याबाबत आलेल्या उल्लेखावरून उमगते. ही यादी बघा-
अण्ण-अन्न, इच्छू-उंस, कञ्जी-कांजि, कलम-साळी, गुड-गुळ, घिअ-तूप, चणस म्हणजे चणे, जव-जवस, तण्डूल-तांदूळ, तिल-तीळ, तुवरी-तूर, दुद्ध-दूध, पाऊ म्हणजे न्याहारी, पिट्ठ-पीठ, मिट्ठ म्हणजे मिष्टान्न, राइआ-मोहरी, लड्डूअ, लोण म्हणजे लवण, सिन्धव म्हणजे सैन्धव या एवढ्या खाद्यपदार्थांचा उल्लेख गाथामधे आला आहे.
गाथेमधे मद्याचाही उल्लेख अकरा गाथांमधे आलेला आहे. त्यात मदिरा, मधुरस, सरक, सुरा व सीधू या प्रकारच्या मद्यांचा उल्लेख आला आहे. या काळात महाराष्ट्रात चौल बंदरातून ग्रीक व्यापारी द्राक्षाची मद्ये व अरब व्यापारी खजुराची मद्ये आणत. या मद्यांचे कुंभ बर्‍याच ठिकाणी सापडले आहेत. मधुरस ही मोहाच्या फुलांची दारू तर याच्याही अगोदरपासून प्रचिलीत होतीच. कदम्बाच्या फुलापासूनही मद्य तयार होत असे. तांदूळ व उसाच्या रसा पासूनही मद्य तयार होत असे.
एका गाथेत तर सुरा जूनी झाली की त्याची प्रत वाढते असा उल्लेख आहे -

पउरजुवाणो गामो महुमासो जोअणं पई ठेरो ।
जुण्णसुरा साहीणा असई मा होउ, किं मरउ ?

ती तरूण आहे, स्वतंत्र आहे. तिचा पती वृद्ध आहे. गावात बरेच तरूण आहेत. या वसंत ऋतूत तिच्याकडे बरेच जूने मद्य शिल्लक आहे...तर तिने तरी काय करावे ? (का मरावे?)
मद्य मिळण्याच्या ठिकाणाला पानकुटी म्हणत.
त्या काळात सामान्य ग्रामजन वेळ कसा घालवित असतील हा प्रश्न बर्‍याच जणांना पडला असेल किंवा पडेल. त्या काळात करमणूकीची साधने अत्यंत कमी असल्यामुळे आपल्या कुटुंबियांशी गप्पा मारत वेळ व्यतीत करणे हे एक महत्वाचे साधन होते. पती पत्नी अर्थातच कामक्रिडेमधे चांगला वेळ घालवत. एका गाथेत पुरूष ढोल वाजवतोय व पत्नी नृत्य करते असाही उल्लेख आहे. पती जर गावाला गेला असेल तर स्त्रियांचा त्याची वाट बघण्यात वेळ चांगला जात असे. शिवाय गावभर भटकण्यातही त्यांचा चांगला वेळ जाई. नटून थटून बाजारात फेरफटका मारणे हेही त्याकाळात स्त्रियांचे वेळ घालविण्याचे चांगले साधन होते. भिंतीवर चित्रे काढणे, किंवा प्रेयसीच्या अंगावरही चित्रे काढली जात.
याबाबतीत एक गंमतशीर गाथा एका माणसाने लिहिली आहे –

मह पइसणा थणजुअले पत्तं लिहिअं ति गव्विआ कीस ? ।
आलिहइस महं पि पिओ जइत से कंपो च्चिअ ण हो‍इ ॥

तुझ्या उरोजांवर तुझ्या पतीने लिहिले आहे म्हणून भाव खाऊ नकोस. माझ्यावरील प्रेमाने त्यावेळी माझ्या पतीचा हात थथरत होता म्हणून नाहीतर त्याने माझ्या स्तनांवर चित्रेच काढली असती......
पुरूषांच्या बाबतीत बोलायचे झाले तर बहुतेकांना एका पेक्षा जास्त बायका असल्यामुळे त्यांना वेळ घालवायचा काही प्रश्न नसावा असे वाटते. याच बरोबर सणवार, नाचणे, गाणे, कथाकथन हे प्रकार होतेच. सवतींच्या भांडणांमुळेही बराच वेळ जात असावा. पुरूषांना गृहस्वामिनी सोडून दुसर्‍या स्त्रियांकडे जायची सोय असल्यामुळे ते त्यातही काळ व्यतीत करत. अशाच एका सवतीचे हे उदगार आपल्याला व्यथित करून जातील –

गोत्तक्खलणं सोऊण पिअ‍अमेा अज्ज तीअ खणदिअहे ।
वज्झमहिसस्स माल व्व मण्डणं उअह ! पहिहाइ ॥

स्वैरार्थ : सणाच्या दिवशी ती नटून थटून त्याच्या बरोबर बसली असताना त्याने चुकून दुसरीचेच नाव घेतले. ते ऐकताच तिच्यावर आभाळच कोसळले. बळी देण्यासाठी रेड्याला जसे सजवतात तसे तिला वाटले........

खालील गाथेत या बिचार्‍या पुरूषाला वेगळ्या कारणासाठी वेळ घालवायचा आहे....
णिक्क्म्माहिं वि छेत्ताहि पामरो णेअ वच्चए वसइसम‍ ।
मुअपिअजाआसुण्णइिअगेहदु:क्खं परिहरन्तो॥

या पामराला पत्नीचे निधन झाल्यामुळे, शुन्यवत झालेल्या घरात जावेसे वाटत नाही म्हणू तो काम नसले तरीही शेतात वेळ काढत आहे..........

त्या काळी मनोरंजनासाठी खेळही खेळले जात. बायका फुगडी व सगळेच सोंगट्या खेळत. त्याला त्या काळात पाशक-शारी म्हणत.( माझ्या वयाचे जे असतील त्यांना सोंगट्या हा खेळ माहीत असेल. पटावर हत्ती, घोडे, शेळी, उंट अशा नावाच्या चार सोंगट्या घेऊन खेळायचा हा खेळ. दान पाडायला कवड्या किंवा फासे असत. एका वेळी चार, सहा, आठ जण खेळू शकत.) कुस्तीही खेळली जाई. नदीवर पोहायला जाणे हाही स्त्री पुरूषांचा आवडता खेळ असे.
सणही साजरे होत त्यांचे उल्लेख छण म्हणजे सण, फग्गुच्छण म्हणजे फाल्गुनोत्सव (होळी), मअ ण म्हण्जे मदनोत्सव ( हा अर्थात वैयक्तिक पातळीवर साजरा व्हायचा पण त्यालाही उत्सव म्हटले आहे), वसंतोत्सव इत्यादि नावाने आले आहेत.

दइ्अकरग्घलुलिओ धम्मिल्लो सीहगन्धिअं वअवणम ।
मअ्णम्मि एत्तिअं चिअ पसाहणं हरइअ तरूणीणम्‍ ॥
प्रियकरामुळे विस्कटलेले केस आणि मद्यामुळे धुंद झालेले मुख, या उत्सवात (मदोनत्सव) एवढाही श्रुंगार तरूणींना बास होतो....

जइथ वि हु दिल्लिंदिलिआ तह वि हु मा पुत्ति ! णग्गिआ भमसु ।
छेआ णअदर्जुआणो माअं धुआ‍इ लक्खंति ॥

ए पोरी तू लहान आहेस, मान्य आहे पण अशी उघडी बागडी फिरू नकोस.
गावातील चावट तरूण, मुलीवरून तिची आई कशी असेल याची कल्पना करतात...

हाल सातवाहनांच्या नंतरचा काल :-

     पुराणांप्रमाणे हालानंतर मंटलक, पुरींद्रसेन, सुंदर सातकर्णी, चकोर सातकर्णी व शिवस्वाती या राजांची नावे येतात. मात्र हालाप्रमाणेच याही राजांबद्दल पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने त्यांचे ऐतिहासिकत्त्व सिद्ध करणे अवघड आहे. शिवस्वाती हा सातवाहन राजघराण्यातील सर्वात महत्वाचा राजा असणाऱ्या गौतमीपुत्र सातकर्णीचा पिता व गौतमी बलश्री हीचा पती असावा. शिवस्वातीच्या कालखंडात सातवाहन घराण्याची फार वाताहत झाली. शकांनी आक्रमण करून महाराष्ट्रावर ताबा मिळवला. त्यामुळे भारताचा पश्चिम भाग सातवाहनांच्या हातातून निसटला व त्यांचे सामर्थ्यही कमी झाले. असे असले तरी शकांचे पूर्वे कडील संभाव्य आक्रमण रोखण्यात मात्र ते यशस्वी झाले. महाराष्ट्रावर हल्ला करणाऱ्या शक राजवांशाचे नाव क्षहरात असे होते. त्यांचा व सातवाहनांचा सतत संघर्ष होत राहिला. तथापि कालौघात सातवाहनांना आपल्या सत्तेचे केंद्र आंध्रात स्थलांतरित करावे लागले
. या कालात कुशाण सम्राटांच्या भूमक आणि नहपान या क्षत्रपांनी (प्रांताधिपतींनी) गुजरात व महाराष्ट्र जिंकून तेथे आपला अंमल बसविला. नहपान व त्याचा जामात ऋषभदत्त यांचे शक संवत् ४१ ते ४६ पर्यंतचे लेख महाराष्ट्रात नासिक, कार्ले वगैरे ठिकाणी सापडले आहेत. त्यांवरून नहपानाचेसाम्राज्य दक्षिणेत कृष्णा नदीपासून उत्तरेत अजमीरपर्यंत पसरले होते असे दिसते.
    प्रभदत्त वा उषवदात याने बौद्घ भिक्षूंकरिता नासिकजवळ लेणी कोरविली, त्यांच्या चरितार्थाकरिता ग्रामदाने दिली, तसेच धर्मशाळा, उद्याने, तलाव इ. लोकोपयोगी कृत्ये केली आणि सहस्र ब्राह्मणभोजने घालून ब्राह्मणांनाही विविध प्रकारची दाने दिली. विदर्भातही रुपिअम्मनामक महाक्षत्रपाचा अंमल होता, हे पौनी (भंडारा जिल्हा) येथे अलीकडे सापडलेल्या छायास्तंभावरून माहीत झाले आहे..
         राजा हालच्या राजवटीनंतर  क्रमशः पत्तलक, पुरिकसेन, स्वाति आणि स्कंदसाति हे राजे सातवाहन साम्राज्याचे राजा झाले. यांचा शासनकाल साधारण ५० वर्ष मानला जातो. स्कंदस्वतिचा शासनकाळाचा शेवट इ.स. ७२ मध्ये झाला.
      स्कंदस्वातिनंतर मंहेद्र सातकर्णी हा राजा बनला. पेरीप्लस ऑफ एरीथ्रियन सी’ या ग्रंथात ग्रीक लेखकाने त्याला मंबर असे म्हणले आहे. या ग्रंथात भरुकच्छ बंदर म्हणजे सध्याचे भडोच याचा तसेच मंबर राज्य करत असलेल्या आर्य देशाचा उल्लेख मिळतो.  
महेंद्र सातकर्णीनंतर कुंतल सातकर्णी सातवाहन शासनकर्ता झाला. याचा कार्यकाळ इ.स. ७३ ते इ.स. ८३ असा मानला जातो. कुंतल सातकर्णीने गुणाढ्यचा आश्रयकर्ता होता, ज्याने बृहत्कथा नावाचा प्राकृत भाषेत ग्रंथ लिहीला.  गुणाढ्यकृत बृहत्कथा हा ग्रंथ उपलब्ध नाही परंतु  सोमदेवने लिहीलेली ‘कथासरित्सागर’ व क्षेमेंद्रने लिहीलेली ‘बृहत्कथामंजरी’ या ग्रंथातून त्याची माहिती मिळते. दक्षिण भारतात बृहत्कथा ग्रंथाचा अनुभव उपलब्ध आहे. सातवाहन साम्राज्याच्या वैभवाचा परिणाम म्हणून बृहत्कथा ग्रंथाची कीर्ति सार्या भारतात पसरली होती.
   बहुतेक सातवाहन राजे प्राकृत तरी कुंतल सातकर्णीची राणी मलयवतीची भाषा मात्र संस्कृत होती. म्हणून राजाला संस्कृत शिकवण्यासाठी त्याचा अमात्य सर्ववर्माने ‘कातंत्र व्याकरण या ग्रंथाची रचना केली. यामुळे  कुंतल सातकर्णी इतका खुष झाला कि त्याने भरुकच्छ प्रदेशाचे शासन सर्ववर्माला दिले.
  याच कुंतल सातकर्णीच्या कारकीर्दित परकीय आक्रमणे सुरु झाली. मात्र कुंतल सातकर्णीने त्या आक्रमणांना यशस्वीपणे परतून लावले. कथासरित्सागर या ग्रंथामध्ये त्याचे साम्राज्य दक्षीण भारत, मध्य प्रदेश , वंग, अंग आणि कलिंग प्रदेशात पसरले होते. उत्तर भारतातील काही राजे त्याचे मांडलीक होते, त्यांनी शक , हुण व कुषाण यांना प्रतिकार केला. उत्तर भारतातील आक्रमक पळून हिंदुकुश पर्वताच्या पश्चिमेला प्राचीन काळच्या कंबोज जनपदात वसले. तिथे पुर्वीच असलेल्या यवन सत्तेमुळे ( ग्रीक लोकांमुळे ) त्यांच्या वागण्यात बदल होउन सभ्य मार्गाकडे त्यांची वाटचाल सुरु झाली. 

गौतमीपुत्र सातकर्णी

 हाल सातवाहनानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याचे चरित्र सांगावयाचे. ज्याचे यशोवर्णन करताना कवींना स्फूर्ती यावी, इतिहासकारांना अभिमान वाटावा व या भूमीला कृतज्ञतेने ज्याचे स्मरण राहावे असा हा सम्राट होता. सातवाहन कुलातील हा सर्वश्रेष्ठ राजा होय. मुस्लीम आक्रमणापासून महाराष्ट्राला मुक्त करणाऱ्या शिवछत्रपतींचे नाव जितक्या आदराने व भक्तिभावाने आपण घेतो तितक्या आदराने व भक्तिभावाने ज्याचे नाव घ्यावे असा महाराज, राजराज गौतमीपुत्र श्री सातकर्णी हा राजा होऊन गेला. शकपल्हव यांनी केवळ भारतावरच नव्हे, तर पाश्चात्य जगावरही आक्रमण केले होते, आणि देशचे देश बेचिराख केले होते. सातवाहनांच्या साम्राज्यावरही इ. सनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात शकांची टोळधाड कोसळली. त्यांची धडक एवढी प्रचंड होती की काही काल हे बलशाली साम्राज्यही मूळापासून हादरले. पण गौतमीपुत्राचा उदय झाला व त्याने या शकांचे निर्दाळण केले. 
    गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची अधिक माहिती घेण्यापुर्वी थोडा ईतिहास समजून घेउया.
      कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. अशोकाने केलेल्या अतिरेकी धर्मप्रसारामुळे, यज्ञयागावरील व मांसाहारावरील कडक बंधनांमुळे जनतेत असंतोष पसरून त्याचे राज्य बलाढ्य राज्य राजकीयदृष्ट्या बरेच कमजोर झाले होते. अशोकाच्या मृत्युनंतर त्याच्या विशाल साम्राज्याचे तुकडे पडून लहान लहान राज्ये अस्तित्वात आली. अशोकानंतर पन्नास वर्षांच्या अवधीतच मौर्य वंशाची सत्ता संपुष्टात येऊन पुष्यमित्र शुंगाने गादी बळकावली. कलिंग देशात खारवेलाने स्वतंत्र राज्य स्थापन केले तर महाराष्ट्रात रथिक, भोजक, पेतेनिक यांच्यापैकीच कुणी एक असलेल्या सातवाहन नावाच्या वीराने आपले स्वातंत्र्य उद्घोषित करून स्वतःचे राज्य स्थापन केले.
 
         त्याचवेळी उत्तर भारतात परकीय सत्तांचे आक्रमण सुरु झाले.  यवन, शक, कुशाण ( युएची ) व हूण या चार जमाती इ. स. चौथ्या शतकापासून इ. सनाच्या पाचव्या शतकापर्यंत मधूनमधून आक्रमणे करीत होत्या. यांतील यवन हे ग्रीक होत. ते सुसंस्कृत होते. पण बाकीच्या तीन जमाती या रानटी होत्या. ग्रीक यवनांची जी भारतावर आक्रमणे झाली त्यांचा चंद्रगुप्त मौर्य, खारवेल व पुष्यमित्र शुंग यांनी निःपात केला.
भारताच्या वायव्य सरहद्दीच्या वर एकापलीकडे एक थेट चीन देशापर्यंत शक- कुशाणांची वसतिस्थाने होती. भूगर्भात असलेल्या लाव्हारसासारखीच यांची स्थिती होती. मधूनमधून यांच्यातील अंतराची आग भडकत असे आणि मग यांच्या पाशवी शक्तीचे उद्रेक होऊन जग कंपायमान होई. इ. स. पूर्व पहिल्या शतकात हूणांची टोळधाड कुशाणांवर व त्यांची शकांवर कोसळून शक हे लाव्हाच्या लोंढ्यासारखे भारतात घुसले. त्यांच्या मागोमाग कुशाण हेही आत लोटले . शकांच्या टोळधाडी भारतावर येऊ लागल्या. त्यानंतर युएची अथवा कुशान या रानटांचे आक्रमण झाले. त्यांनी तर दीर्घकालपर्यंत उत्तर भारतावर साम्राज्य स्थापिले होते. ते संपुष्टात आल्यावर हूणांच्या टोळधाडी येऊ लागल्या. पण भारतातले लोक त्या काळी समर्थ व पराक्रमी होते. त्यामुळे ही आक्रमणे त्यांनी निर्दाळून त्या आक्रमकांचा निःपात केला, इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर धार्मिक व सांस्कृतिक विजय मिळवून भारतीय समाजात व संस्कृतीत त्यांना संपूर्णपणे विलीन करून टाकले. शक लोक अशा क्रूर, रानटी जमातींपैकीच होते. उत्तरेत शुंगांनंतर समर्थ अशी राजसत्ता न राहिल्यामुळे त्यांना तेथे भराभर जय मिळाले व तेथे आपली राज्ये स्थापन केली.
     सन ७८ मध्ये कुशाणवंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली. त्याने लवकरच बहुतेक उत्तर भारत आक्रमून दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. संस्कृतीविहीन, धर्मविहीन, रानटी अशा ह्या शकांना कुशाणवंशीयांनी आपलेसे केले.  शकांना साम्रज्यस्थापनेची ऐपत नव्हती. ते भारतात आधी आले, पण कुशाणांचे ते क्षत्रप–सरदार, सुभेदार म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेत.  मौर्य साम्राज्य लयाला गेल्यानंतर भारताच्या उत्तर पश्चिम भागात मध्य आणि पश्चिम आशियातील लोकांचे राज्य होते. ख्रिस्तपूर्व इ.स. १८० ते इ.स. ५५  या काळात इंडोग्रीक यांचे राज्य या भागात होते. ख्रिस्तपूर्व १ल्या शतकात इंडो स्किथीयन अर्थात शकांनी या भागावर ताबा मिळवला आणि शक साम्राज्याची सुरुवात झाली.
मॉइस वा मोगा हा त्यांचा पहिला शासक, तो गांधारचा राजा होता. त्याची राजधानी सिरकप होती (आजचे पंजाब, पाकिस्तान). त्याने आजूबाजुचा इंडोग्रीक परिसर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा यशस्वी झाला नाही. याने पाडलेल्या अनेक नाण्यांवर बौद्ध आणि हिंदू चिन्हं होती. तसेच ग्रीक आणि खरोश्ती भाषेचा वापर केलेला होता. याचाच वंशज चास्तना किंवा चेस्तनने शकांचे राज्य उजैनपर्यंत वाढवले
काही इतिहास अभ्यासकांच्या मते क्षत्रप ही पदवी पर्थियन या सिथियन राज्याची द्योतक आहे. मूळ शब्द क्षत्रपावन असून त्याचा अर्थ भूपाल असा होतो. हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेस बॅक्ट्रीयाचे राज्य होते तर बॅक्ट्रीयाच्या पश्चिमेस पर्थियनांचे राज्य होते. इ.स.पू. २३१ पासून मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागलेली बघून या  बॅक्ट्रीयाच्या शकांनी व पर्थियानांनी हिंदुस्थानावर हल्ले चढवून काही भाग जिंकून घेतला व त्याचा कारभार बघण्यासाठी काही भुपालांना नेमले तेच हे क्षत्रप.
भारतीय आणि पाश्चिमात्य साहित्यातून शक क्षत्रपांचे विस्तृत उल्लेख आपल्याला सापडतात. पाश्चिमात्य साहित्यात स्ट्रोबो, एरियन, प्लिनी, टोलेमी यांच्या लेखात तर पेरीप्लस या ग्रंथात शकांचा उल्लेख आलेला आहे, तर भारतीय साहित्यात महाभारत आणि पुराणांमध्ये शकांचा उल्लेख आलेला दिसतो. महाभारतामध्ये शक योध्ये भारतीय युद्धामध्ये दुर्योधनाच्या बाजूने लढल्याचे म्हणले आहे. तसेच शक, यवन, पहलव, बर्बर आणि किरत आदी सिंधू खोऱ्यात राहत असत असे उल्लेख महाभारतात आहेत. 
क्षत्रपांनी उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतावर काही काळासाठी राज्य केले. ते स्वतःस राजा, स्वामी व महाक्षत्रप अशी बिरुदे लावत. त्यांच्या बिरुदांवरून तसेच शिलालेख आणि नाण्यांवरून ते स्वतंत्र झाल्याचे स्पष्ट होते. या क्षत्रपांची अनेक घराणी भारताच्या वेगवेगळ्या भागात राज्यकारभार करत होती. त्यापैकी पंजाब, मथुरा, तक्षशिला येथील क्षत्रपांना पश्चिमी क्षत्रप असे म्हणत तर महाराष्ट्रात राज्य करणाऱ्या क्षत्रपांची क्षहरात आणि कार्दमक अशी दोन घराणी होती. त्यांनी इ.स. ७८ ते ३०४ या कालखंडात महाराष्ट्रात राज्य केले. 
क्षहरात हे क्षत्रपांचे महाराष्ट्रावर राज्य करणारे पहिले परकीय घराणे होय. महाराष्ट्रात या क्षत्रपांनी सातवाहनांशी जोरदार संघर्ष केला. महाराष्ट्रातील सातवाहन सत्तेच्या अधःपतनाचे मुख्य कारणच क्षत्रपांचे सततचे हल्ले हेच होय. महाराष्ट्राच्या नाशिक जुन्नर परिसरावर क्षहरात घराण्याचे राज्य होते. नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून महाराष्ट्रातील पहिला क्षत्रप अघुदक वा अभेदक हा समजला जातो. त्याच्या नंतर भुमक, नहपान हे महत्त्वाचे राजे या घराण्यात झाले. क्षत्रपंची दुसरी शाखा असणाऱ्या कार्दमक घराण्यात चष्टन, रुद्रदामन हे महत्त्वाचे राजे होऊन गेले. 
       प्रथम कनिष्काने कच्छ जिंकून तेथे त्याने कार्दमक वंशीय 'चष्टन' याची आपला क्षत्रप म्हणून नेमणूक केली. पुढे कनिष्काने महाराष्ट्राच्या उत्तर भागात 'भूमक' हा क्षहरात वंशी दुसरा क्षत्रप नेमला. क्षहरात हा सुद्धा पर्शियन शब्द असून क्षहर म्हणजे नगर व राद् म्हणजे अधिपती. अर्थात नगराधिपती. भूमकाने गुजरात, काठेवाडाचा काही भाग, माळवा या प्रांतांवर आक्रमण करून त्यांचा ताबा मिळवला. त्याने महाराष्ट्राचा किती प्रदेश जिंकला होता याचे उल्लेख मात्र सापडत नाही. कनिष्काच्या मृत्युनंतर कुशाण राजवट कमजोर होऊन शकांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली व ते स्वतःस स्वामी, राजा, महाक्षत्रप अशा विशेषणांनी गौरवू लागले. क्षत्रपांची अनेक घराणी भारताच्या निरनिराळ्या प्रांतात लहान लहान राज्ये चालवू लागली. मथुरा, पंजाब, तक्षशीला यांवर अंमल करणार्‍या क्षत्रपांस 'उत्तरी क्षत्रप' तर माळवा, गुजरात, उज्जैन, उत्तर महाराष्ट्र यांवर अंमल करणार्‍यांस पश्चिमी क्षत्रप म्हणत असत.
महाराष्ट्रात इ.स. ३०४ पर्यंत चष्टन घराण्याने राज्य केले, तर इ.स.३८८ पर्यंत रुद्रसिंह घराण्याने राज्य केल्याचे दिसते. याच काळात उत्तरेत गुप्त राजा चंद्रगुप्त दुसरा आणि तर दक्षिणेत असलेला वाकाटक राजा पृथ्वीसेन यांनी क्षत्रपांनविरुद्धची मोहीम उघडली. त्यांनी एकत्रित हल्ले करून इ.स.३९० च्या सुमारास क्षत्रपांचे राज्य नष्ट केले. यामुळेच गुप्त राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य याने स्वतःला ‘शकारी’ म्हणजेच शकांचा विनाश करणारा असे बिरूद लावलेले आहे. 

    क्षत्रपराजा नहपान

    महाराष्ट्रातील क्षहरात घराण्यातील पहिला माहीत असलेला क्षत्रप म्हणजे भुमक होय.मंदसोर येथे राजधानी असलेला नहपान पराक्रमी व महत्वाकांक्षी होता. त्याने सत्तेत येताच आपल्या राज्याचा विस्तार करण्याचे धोरण आखले आणि प्रबळ फौजेच्या जोरावर त्याने सुंदर सातवाहनचा पराजय केला. त्याने नाशिक, पैठण जिंकून तर घेतलेच परंतु पार पुण्यापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केला. याच्या विषयी जास्त माहिती उपलब्ध नसली तरी त्याची नाणी मात्र मुबलक प्रमाणात मिळालेली आहेत. गुजरात, काठेवाड, माळवा या ठिकाणी मिळालेली नाणी आणि इतर पुराव्यांवरून भुमकाचा अंमल माळवा, गुजरात, सौराष्ट्र, बेहडाघाट या परिसरावर असावा असे दिसते. भुमकाच्या नाण्यांवर दर्शनी बाजूस खरोष्टी मध्ये ‘ छत्रपस भुमकस’आणि मागील बाजूस ब्राह्मी मध्ये 'क्षहरातस क्षत्रपस भुमकस ' असा लेख आढळतो. 
      भुमकानंतर नहपान हा क्षत्रप झाला. त्याचे आणि भुमकाचे नाते काय असावे याचा काही अंदाज आज बांधता येत नाही. नहपानाने राजा ही पदवी धारण केली होती. नहपान हे इराणी नाव असून नह म्हणजे जनता आणि पन म्हणजे रक्षणकर्ता, म्हणजेच जनतेचे रक्षण करणारा असा अर्थ होय. यावरून हे एक उपपद असावे असे वाटते. 
नहपान क्षत्रपाची मुद्रा असलेले नाणे

नहपानाने इ.स.९८ ते १२४ अशी सव्वीस वर्षे राज्यकारभार केला. त्याचे कोणतेही कोरीव लेख उपलब्ध नाहीत. असे असले तरी त्याचा जावई उषवदत्त आणि मंत्री असणाऱ्या आयम यांच्या लेखातून नहपानाच्या कारकीर्दीचा तपशील आपल्याला मिळतो. 
        नहपान कालीन नाशिक, कार्ले, जुन्नर या लेखांवरून त्याचे राज्य उत्तरेस अजमेर, दक्षिणेस नाशिक - पुण्यापर्यंत तर पश्चिमेस गुजरात काठेवाड, उत्तर कोकणापासून ते पूर्वेस माळव्या पर्यंत पसरलेले होते. त्याची चांदीची व तांब्याची नाणी मुबलक प्रमाणात मिळालेली आहे. नहपानाने स्वतःच्या नाण्यांवर मागील बाजूस क्षहरात वंशाची वज्र, वर्तुळ, बाण ही चिन्हे कोरलेली दिसतात तर दर्शनी बाजूस स्वतःचा मुखवटा कोरलेला आहे. तसेच त्याच्या नाण्यांवर ग्रीक, ब्राह्मी आणि खरोष्टी अश्या तीन लिप्यात व भाषेत त्याचे ' रात्रौ क्षहरात नहपानस ' हे नाव कोरण्यात आले आहे. इतक्या भाषेत नाणी प्रचारात आणणारा तोच एकमेव नृपती असावा. 
नहपानाच्या काळात क्षत्रपांचे पाश्चिमात्य देशाशी व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. त्यांनी पश्चिमेकडील किनारपट्टी आणि अरबी समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सातवाहनांशी संघर्ष केल्याचे पेरीप्लस या ग्रंथात म्हणले आहे.
          सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचे वडील असणाऱ्या शिवस्वातीच्या काळात नहपानाने सातवाहानांकडून गुजरात, काठेवाड, माळवा, कोकण आणि महाराष्ट्राचा काही भाग जिंकून घेतला. सातवाहनांची राजधानी असणारे पैठणसुद्धा त्याने जिंकून घेतले होते. यावरून त्याचा पराक्रम सिद्ध होतो. 
नहपानाच्या अखेरच्या कारकीर्दीत सातवाहनांचा पराक्रमी राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने अठरा वर्षे नहपानाशी यूध्दे केली, अखेर नाशिक जवळील गोवर्धन परिसरात गौतमीपुत्राने नहपानाचा संपूर्ण पराभव केला व महाराष्ट्रातून क्षत्रपांचे समूळ उच्चाटन केले. 
सातवाहन क्षत्रप घराण्यातील संघर्षात सातवाहन राजे यावेळेस जरी विजयी झाले असले तरी क्षत्रपांच्या नंतरच्या आक्रमणामुळे त्यांना आंध्रामध्ये स्थलांतरित व्हावे लागले. 

भूमकाच्या नंतरच्या पिढीतील नहपान हा याचा मुलगा किंवा वंशज होता. हा व याचा जावई उपवदात ( ऋषभदत्त ) यांनी आपली सत्ता पुष्कळच वाढविली. त्यांनी माळवा आक्रमिला, नर्मदेचे खोरे जिंकले व ते महाराष्ट्रात उतरले. या वेळी म्हणजे इसवी सन १२५ च्या सुमारास मंदालक, पुरींद्रसेन हे प्रतिष्ठानच्या गादीवर असलेले सातवाहन राजे दुबळे होते. नहपान क्षत्रपाने सातवाहनांची बरीचशी राज्यलक्ष्मी हरण करून जुन्नर, नाशिक, कोकण, विदर्भ आदी विस्तृत प्रदेश बळकावत सातवाहनांना पार प्रतिष्ठान (पैठण) पर्यंत ढकलले. त्यामुळे वऱ्हाड, कोकण, कुंतल या भागांवर शकसत्ता स्थापन झाली. नहपान हळूहळू जुन्नर, कार्ले येथपर्यंत घुसला. दोन्ही ठिकाणी त्याचे शिलालेख आहेत. त्यांत त्याने मिळविलेल्या या यशाचा खूपच गौरव केलेला आहे.स्वतः नहपानाने जुन्नर ही राजधानी केली असावी असे काही पुरातत्वीय पुराव्यांनुसार मानले जाते. क्षत्रपांच्या या आक्रमणांनुळे क्षणभर सातवाहन साम्राज्य नष्ट होणार व अखिल भारत परकीयांच्या सत्तेखाली जाणार अशी चिन्हे दिसू लागली. पण सातवाहनकुलात गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला व हे भयावह संकट टळले.
   नहपानाचा जावई उषवदात (ऋषभदत्त) याने आपल्या अनेक धर्मकृत्यांचा व दानांचा उल्लेख नाशिकच्या शिलालेखाद्वारे करून ठेवला आहे. यावरून त्याच्या आणि त्याचा सासरा नहपान यांच्या राज्यविस्ताराची, त्यांच्या साधनसंपत्तीची पुरेशी कल्पना येते. हे शक मूळचे रानटी जरी असले तरी इथली संस्कृती त्यांनी आपलीशी केली होती. शक,कुशाणांच्या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. यांना स्वतःची अशी संस्कृती व धर्म नव्हता. त्यामुळे भारतात येताच ते बौद्ध व वैदिक धर्माचे अनुयायी होत.  कुशाणसम्राट कनिष्क हा बौद्ध होता व त्याचा नातू वासुदेव हा परमभागवत म्हणवून घेण्यात भूषण मानीत असे. नहपानाचा जावई याने ऋषभदत्त है हिंदू नाव स्वीकारले होते व तो पौराणिक हिंदुधर्माचा कट्टा पुरस्कर्ता होता. त्याने अनेक गावे ब्राह्मणांना दान दिली, लक्ष भोजने घातली, पुष्करतीर्थात स्नान करून गोप्रदाने दिली, असे उल्लेख त्याच्या शिलालेखांत आहेत. बौद्धांनाही त्याने अशाच उदार देणग्या दिल्या होत्या. यामुळे त्याची सत्ता जास्तच दृढ झाली. बौद्धांना उदार राजाश्रय देऊन ब्राह्मणांनाही विपुल दानधर्म केला होता. नाशिकच्या शिलालेखात नहपानाचा उल्लेख 'क्षत्रप' असा आलेला असून कारकिर्दीचे वर्ष शके ४४ आहे तर जुन्नरजवळच्या मानमोडी लेणीतील शिलालेखात नहपानाचा अमात्य आयम नहपानाचा उल्लेख 'महाक्षत्रप' असा करतो व त्यात शके ४६ असा काल उल्लेख आहे. म्हणजेच केवळ दोनच वर्षात नहपान क्षत्रप पदावरून महाक्षत्रपपदाला पोहोचला पण दुर्दैवाने हेच त्याच्या कारकिर्दीचे आणि वंशाचेही शेवटचेच वर्ष ठरले.

क्षत्रपराजा रुद्रदामन

     चष्टन हा कार्दमक घराण्यातील भुमक आणि नहपान यांचा समकालीन क्षत्रप होता. कुशाण सम्राट कनिष्काने कच्छ परिसराचा ताबा घेऊन त्यावर चष्टन याला क्षत्रप म्हणून पाठविले. चष्टनचा पिता सौमितिक याला कोणतीही पदवी नसल्याने चष्टन हा स्वबळावर क्षत्रप या पदापर्यंत पोहचल्याचे दिसते. आधी फक्त क्षत्रप असणाऱ्या चष्टनाने नंतर मात्र महाक्षत्रप हे संपूर्ण स्वातंत्र्यनिर्देशक बिरूद धारण केलेले दिसते. चष्टनाची चांदीची आणि तांब्याची नाणी सापडलेली असून ती त्याच्या क्षत्रप व महाक्षत्रप काळात पडल्याचे दिसते. त्याचा पुत्र असणारा जयदामन हा फक्त क्षत्रप पदापर्यंत पोहचलेला दिसतो, त्याचे मुख्य कारण म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीचे त्या काळातील असलेले वर्चस्व.
       जयदामनानंतर त्याचा पुत्र रुद्रदामन हा क्षत्रप झाला. त्याची राजधानी होती उज्जैन. हा एक मोठा दिग्विजयी क्षत्रप होता. तो शकांचे वर्चस्व वाढवून महक्षत्रप झाला. सुरुवातीच्या काळात सातवाहनांन विरोधात रुद्रदामनाने अनुनयाचे धोरण स्वीकारलेले दिसते. आपली मुलगी त्याने गौतमीपूत्र सातकर्णीचा द्वितीय पुत्र असणाऱ्या पुळूमाविस लग्नात दिली. मात्र गौतमीपुत्राच्या मृत्यू नंतर मात्र त्याने सातवाहननांविरुध्दचा संघर्ष सुरू केला. संपूर्ण आनर्त, सौराष्ट्र, मारवाड, सिंधू, सौविर, अनुप आणि आकरवांती हे भूप्रदेश त्याने जिंकून घेतले. या युद्धात त्याने दक्षिणापथपती असणाऱ्या पुळूमाविचा सलग दोनदा पराभव केला. सोबतच त्याने यौधेयांना पराभूत केल्याचे व आंध्रावर विजय मिळवल्याचे त्याच्या गिरनार शिलालेखावरून समजते. त्याचे राज्य अपरान्त, नाशिक - सोपाऱ्यापासून उत्तरेकडे मुलतान पर्यंत पसरलेले होते. 
   रुद्रदामन हा दानशूर, विद्याव्यासंगी व कलाभिज्ञ राजा होता. तो वैदिकधर्मअनूयायी व संस्कृत भाषा आणि साहित्य यांचा आश्रयदाता होता. शुंग राजांनंतर याचेच लेख हे संस्कृत भाषेत सापडतात. त्या काळात संस्कृत अलंकार, न्याय आदी शास्त्रांचा बराच विकास झाल्याचे दिसते. रुद्रदामनाने कलाकारांना व विद्वानांना मोठ्या प्रमाणात आश्रय दिला होता. त्याची कारकीर्दही मोठी असल्याने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती झाली. त्याचा नाण्यांवरून तो ६० वर्षापर्यंत म्हणजे इ.स. १६५ पर्यंत राज्य करीत असल्याचे दिसते. 
          रुद्रदामनानंतर उजैनीच्या शकांची शक्ती क्षीण होत गेली. जसे क्षत्रप सातवाहनांच्या नाशास कारणीभूत झाले तसेच सौराष्ट्राचे अभिर हे या शकांच्या नाशाचे कारण झाले. अभिर राजा ईश्वदत्त याने शकांना मोठा धक्का दिला, मात्र त्यातून सावरून शकांची सत्ता इ.स. ३८० पर्यंत अवंतीच्या मर्यादित प्रदेशावर असल्याचे दिसते. मात्र नंतर गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याने मध्य व पश्चिम भारतावर विजय मिळवला आणि त्याच्या सामर्थ्यापूढे उजैनीच्या शकांचा निभाव लागला नाही.
 
रूद्रदामन क्षत्रपाची मुद्रा असलेले नाणे
 
       शक क्षत्रपांच्या सततच्या हल्ल्यांनी जेरीस आल्यामुळे सातवाहनांची राज्यव्यवस्था खिळखिळी होऊन गेली. सह्याद्रीतील घाटमार्ग क्षत्रपांच्या ताब्यात गेल्यामुळे सातवाहनांकडे येणार्‍या संपत्तीचा ओघ खुंटला गेला. तत्कालिन सातवाहन नृपती शिवस्वातीच्या काळात सातवाहन राज्य गलितगात्र होऊन गेले. त्याच्या अमलाखाली फक्त दक्षिण महाराष्ट्राचा भूभाग राहिला होता असे दिसते. अशातच शिवस्वाती सातकर्णी याची पत्नी गौतमी बलश्री हिच्या पोटी एका पराक्रमी पुत्राचा जन्म झाला तोच गौतमीपुत्र सातकर्णी.
पुराणात सांगितल्या प्रमाणे शिवस्वाती नंतर गौतमीपुत्र सातकर्णी हा बाविसावा नृपती गादीवर आला. आंध्र राजांच्या विविध याद्यांचा समन्वय केला, तर गौतमीपुत्र हा सिमुकापासून २३ वा राजा ठरतो. ‘अप्रतिहतचक्र’ अशी त्याची उपाधी होती. त्याचा शासनकाळ कोणता, यावर अनेक मतांतरे आहेत. पण, इ. स. ६०/७० ते ८५/९५ या दरम्यान केव्हा तरी तो असावा. एक जनमान्य समज- विशेषत: दक्षिण भारतात असा आहे, की शालिवाहन हे गौतमीपुत्राचेच एक प्रचलित नाव होते; गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्लव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती.
हा सातवाहन घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय. असे असले तरी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सातवाहन राज्य मोडकळीला आले होते. कारण उत्तर भारताचा बव्हंशी भाग हा सम्राट कानिषकाने आपल्या ताब्यात घेतला होता. सोबतच क्षत्रप राजा नहपान याने जुन्नर पर्यंत धडक मारून सातवाहनांना तेथून हुसकावून लावले व तेथे आपले सत्ताकेंद्र निर्माण केले होते. नंतरच्या काळात तर सातवाहनांची राजधानी असणारे प्रतिष्ठान हे सुद्धा क्षत्रपांनी जिंकून घेतलेले दिसते. 
इ. स. ७२ साली गौतमीपुत्र प्रतिष्ठानच्या गादीवर आला व पहिली पंधरासोळा वर्षे तयारीत घालवून नंतर त्याने शकांवर चढाई करण्यास प्रारंभ केला.  
गौतमीपुत्र सातकर्णीचा उदय झाला. हा धाडसी, शुर तर होताच पण अत्यंत धोरणी होता. आपली शक्ती कमी आहे तर नहपानाची अवाढव्य हे त्याने ओळखून गनिमी काव्याचा आधार घेत नहपानाशी संघर्ष सुरु केला. स्वातंत्र्यप्रिय मराठी सैनिक त्याला येऊन सामील होऊ लागले. हा लढा सोपा नव्हता. नहपानाचे साम्राज्य आता उत्तर आणि दक्षिणेतही विस्तारलेले होते. तब्बल वीस वर्ष हा संघर्ष चालला.त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला.गौतमीपुत्र सातकर्णी अतिशय कुशल, धोरणी आणि महाप्रतापी होता. त्याने आपल्या कारकिर्दीच्या पंधरा सोळा वर्षात हळूहळू आपले सामर्थ्य वाढवत नेऊन परकी आक्रमकांच्या दास्यातून आपले साम्राज्य मुक्त करण्याचा निश्चय केला
प्रथम त्याने पुणेप्रांत, मावळ प्रांत मोकळा केला व मग उत्तरेस स्वारी केली.
 दरम्यान एका आख्यायिकेनुसार गौतमीपुत्राने काही कुशल हेर म्हणून त्याच्या राज्यात घुसवले आणि नहपानाला भरमसाठ दानधर्म करायला उद्युक्त तर केलेच पण त्याच्या सैन्यदलाची अनेक गुपिते माहित करून घेतली. शेवटी त्याने नाशिक जवळ नहपानाची सेना अचानक कोंडीत पकडून अतिशय निकराचे युद्ध केले आणि इसवी सन ७८ मध्ये नहपानाचा समूळ पराभव केला आणि त्याला ठार मारले. ( कांहीच्या मते नहपानाला नाशिकच्या गोवर्धन परिसरात गाठून गौतमीपुत्राने त्याचा प्रचंड मोठा पराभव केला. आणि नहपानाला सह्याद्रीचा आश्रय घेण्यास भाग पाडले. युद्धानंतरच्या पंधरवड्यातच सह्याद्रीच्या रांगानमध्ये नहपानाचा पाठलाग करून गौतमीपुत्राने त्याचे समूळ उच्चाटन केले, )  
त्याची आणि नहपानाची घनघोर लढाई नाशिकजवळच्या गोवर्धन पर्वताजवळ झाली. हा गोवर्धन पर्वत नेमका कुठला ते आता समजत नाही पण हा बहुधा त्र्यंबकेश्वरनजीकचा डोंगरी प्रदेश असावा. तीत नहपानाचा संपूर्ण पराभव होऊन तो सह्याद्रीच्या पर्वतरांगामधे आश्रयार्थ पळून गेला. या विजयानंतर गौतमीपुत्राने लागलीच नाशिकच्या लेण्यांस भेट देऊन तेथील बौद्ध भिक्षुसंघास 'अजकालकीय' नावाचे शेत निर्वाहासाठी दान केले व तसा उल्लेख तेथील शिलालेखामध्ये केला. याच लेखात गौतमीपुत्र स्वत:ला बेणाकटकस्वामी म्हणवतो. नाशिकचे युद्ध गौतमीपुत्राच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी झाले होते. गौतमीपुत्राच्या राज्यारंभाचे वर्ष निश्चितपणे माहीत नाही पण नहपानाच्या कारकिर्दीचे शेवटचे वर्ष शके ४६ आहे. त्यानुसार इस. १२५ मध्ये ही घटना घडली असावी.
        नाशिक येथील विजयानंतर गौतमीपुत्राने सह्याद्रीमध्ये नहपानाचा पाठलाग करून त्याचा समूळ वंशविच्छेद केला व लागलीच कार्ले येथील लेणीला भेट देऊन तिथल्या बौद्ध संघाला निर्वाहासाठी करजक नावाचे गाव दान देऊन तसा शिलालेख तिथल्या भिंतीवर कोरविला. दोन्ही शिलालेखांतील वर्णनानुसार ह्या दोन युद्धात सुमारे पंधरा दिवसांचे अंतर होते असे दिसते. गौतमीपुत्राच्या कार्ले शिलालेखावरून नहपानाचा विच्छेद मावळप्रांती झाला असावा असे मानण्यास पुरेसा वाव आहे. या युद्धात फार मोठी कत्तल झाली. गौतमीपुत्राने नहपानाची सर्व नाणी जप्त करून त्यावर पुन्हा आपली मुद्रा उमटवून ती नाणी परत वापरात आणली. अशी जवळजवळ तेरा हजार नाणी सापडली आहेत.
नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्र अभिमानाने नोंदवतो- “खखरात वंस निर्वंस करस.” (क्षहरात वंशाला निर्वंश केले.) महाराष्ट्राला तर स्वातंत्र्य मिळालेच पण शेजारील अन्य राज्यातही त्याचा अफाट विस्तार झाला. “पेरीप्लस ऑफ अरेथ्रीयन सी” या तत्कालीन ग्रीक पुस्तकात गौतमीपुत्राच्या काळातील महाराष्ट्राच्या समृद्धीचे वर्णन आलेले आहे.
  नहपान व उषवदात या दोघांनाही कंठस्नान घालून मग दक्षिणेत जेवढे म्हणून शक, यवन, पल्हव होते त्यांच्या एकतर त्याने कत्तली केल्या किंवा त्यांना उत्तरेत पिटाळून लावले. यवन हे बौद्ध झाले होते. साहजिकच त्यांचा ओढा या परकीयांकडे होता. त्यामुळे त्यांचेही गौतमीपुत्राने निर्मूलन केले. या विजयानंतर लगेच सतत स्वाऱ्या करून सम्राट सातकर्णीने पूर्वपश्चिम माळवा, नर्मदापरिसर, विदर्भ, कोकण, सर्व उत्तर महाराष्ट्र हे मुक्त केले. आणि उत्तरेकडील क्षत्रपांच्या ताब्यातील पश्चिम रजपुताना, सौराष्ट्र हे प्रदेशही साम्राज्यात समाविष्ट करून टाकले. त्याने विदर्भावर आक्रमण करून वेणातिराच्या क्षत्रपांचा बीमोड केला आणि स्वतःला ' वेणाकटकस्वामी ' असे घोषित केले. पुढील काळात महेन्द्र, मलय, आंध्र, कलिंग हेही प्रदेश त्याने जिंकले व 'त्रिसमुद्रतोयपीतवाहन' (  'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' ) - हे बिरुद त्याने सार्थ केले. 
   या राजासंदर्भात एक कथा सांगितली जाते कि गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि सातवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे वजन किती हे नक्की सांगता येईल का? ह्यावर सातवाहनाच्या पंडितांनी उपाय असा काढला कि पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. मग हत्तीला नावेत चढवले आणि पाणि नांवेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढून त्याजागी माती भरली बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेपर्यंत. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनासकट परत पाठवला. अशीच कथा आदिलशाही सरदार मुरार जगदेव व शहाजी महाराज यांच्या बाबतीत सांगितली जाते. नावेतून हत्तीचे वजन करण्याच्या युक्तीमुळे जिथे हि घटना झाली, त्या गावाचे नाव नागरगाव बदलून तुळापुर ठेवण्यात आले. 

 
गौतमीपुत्र सातकर्णीचे चांदीचे नाणे

आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. त्यापैकी काही नाण्यांवर शातकर्णीचा चेहरा दिसतो. गौतमीपुत्र हे त्याचे खास उपपद होते असे दिसते. त्याच्या नाण्यांवर हे उपपद स्पष्ट कोरलेले दिसते. त्यानेही वासिष्ठीपूत्रा प्रमाणे द्वैभाषिक लेख असलेली स्वतः च्या मुखवट्याची चांदीची नाणी प्रचारात आणली. त्याच्या नाण्यांवरील छापा वरून तो एक धर्मनिष्ठ नृपती असल्याचे जाणवते. मस्तकावरील पांचशिखा, मानेवरून खांद्यावर रुळणारी मुख्य शिखा, कानातील कुंडले, कपाळावरील भस्माचे पट्टे, भेदक नजर ही त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ठे होत. त्याच्या काळात समुद्रावरील व्यापारावर त्याचे वर्चस्व असावे असे त्याच्या आंध्र येथे सापडलेल्या नाण्यावरून समजते ज्यावर शिडाच्या बोटीचा छाप आहे.
नाहपण राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नाहपणाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वागवत होता असे वाचायला मिळते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले.
   या राजाबद्दल नाशिक येथे खुद्द त्याची आई गौतमीच्या सांगण्यावरून आपल्या मुलाची स्तुती करणारा शिलालेख कोरलेला आढळतो, त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे --
"क्षत्रियांचा (त्याकाळचे इतर राजे, राजघराणी) गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात (KShaharat) घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुन:स्थापित करणारा....." सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'असा गौरवपूर्वक उल्लेख केला गेला आहे. 
नाशिकच्या लेखात त्याच्या मातेने त्याची राम, केशव, अर्जुन, भीमसेन यांच्याशी तुलना केली आहे, नहुप, जनमेजय, ययाती, सागर यांच्यासारखाच तो पराक्रमी होता असा त्याचा गौरव केला आहे. त्यात मातेचे कौतुक असले तरी सत्यार्थही बराच आहे असे आपणांस दिसून येईल.

गुढीपाडव्याचे सत्य :-

सातवाहन साम्राज्याची माहिती घेताना एका अपरिहार्य आणि वादग्रस्त विषयाची चर्चा करावी लागते ती म्हणजे एक महत्वाचा हिंदु सण गुढीपाडवा ! यासंदर्भात वादाच्या दोन्ही बाजु समजून घेउया.
 चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला गुढीपाडवा हे नाव आहे. या दिवशी हिंदूूंच्या नवीन वर्षांची सुरुवात होते म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असेही नाव आहे. भारतीय परंपरेमध्ये अतिशय मोठय़ा प्रमाणात वापरला गेलेला आणि शालिवाहन शक नावाने प्रसिद्ध असलेला संवत्सर या दिवशी सुरू होतो. या संवत्सराची स्थापना शालिवाहन म्हणजे सातवाहन या राजाने शक राजांचा पराभव करून केली असे सर्व भारतीय मानतात. ही घटना साजरी करण्यासाठी आपापल्या घरांवर गुढय़ा उभारल्या जातात. कलियुगाची ३,१७९ वर्षे संपल्यानंतर या संवत्सराची सुरूवात होते असेही भारतीय परंपरेत मानले आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने या दिवशीच सृष्टीची निर्मिती केली असाही समज लोकांमध्ये रूढ आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. फार प्राचीन काळापासून गुढीपाडवा आणि शालिवाहन शकाची सुरुवात या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडला गेला आहे. 
Gudi Padwa 2024: 7 must-know details about the festival
        हाच दिवस महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ तर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ‘युगादी’ म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे सिंधी उत्सव ‘चेटी चंड’ हा देखील याच दिवशी साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय आहे. प्रांतागणिक येथे विविधता आढळते. ही विविधता सण, उत्सव यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी आहे. भारतीय परंपरांना सांस्कृतिक महत्त्वासह ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हेच ऐतिहासिक महत्व गुढीपाडवा या सणालाही आहे. आज मोठ्या प्रमाणात ग्रेगोरियन दिनदर्शिका प्रचलित असली तरी भारतीय मातीत निर्माण झालेल्या शक व विक्रम या दोन दिनदर्शिकांचे भारतीय समाजातील महत्त्व अबाधित आहे.  पुराणानुसार, गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली.
      विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. हिंदूकालगणनेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत या दोन संवताला महत्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनात आपण इंग्रजी तारीख वापरतो, पण सण समारंभ हिंदू तिथी नुसारच साजरे  होत असतात, त्यात सुद्धा आपण शालिवाहन शकाचा काळगणने साठी जास्त वापर करतो. दरम्यान, शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरात आहे. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी जाणून घेऊया
          मुळात भारतीय कालगणनेच्या क्षेत्रात “शक’ या शब्दास अनन्यसाधारण महत्त्व आहे. युधिष्ठिर शक, शालिवाहन शक, विक्रम शक, शिव शक इ. शब्दांमधील “शक’ हा शब्द परकीय भाषांमधील “सन’, “साल’ या अर्थाने म्हणजे कालगणनेचा वाचक मानला जातो. शालिवाहन शक येशू खिस्ताच्या जन्मानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी सुरू झाला. तो महाराष्ट्रच नव्हे, तर दक्षिण क्षेत्र आणि उत्तरेकडीलही काही राज्यांत चालला. धर्मकृत्यांत अजूनही चालतो. या वेळी महाराष्ट्रात सातवाहन वंशाचे राज्य होते. शालिवाहन हा शब्द “सातवाहना’चा पर्याय म्हणूनही वापरला जातो. त्यावरून ही कालगणना सातवाहन वंशातील राजाने सुरू केली. “ज्याच्या योगाने काल गणणे शक्‍य होते तो शक’. “शक’ हा शब्द “शक्‍नोति’पासून निष्पन्न झाला. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
         प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रात आपण “पाडवा’ असे म्हणतो. त्याची गणना साडेतीन मुहूर्तांमध्ये होते. दिवाळीच्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या आणखी एका म्हणजे विक्रम शकाच्या वर्षारंभाच्या दिवसापेक्षा, म्हणजेच पाडव्यापेक्षा त्याचे वेगळेपण सांगण्यासाठी त्याला “गुढी पाडवा’ असे म्हटले जाते. त्या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून नव्या उमेदीने जगण्यास आपण सज्ज होतो. दक्षिणेकडे या दिवसाला “युगादी’ असे म्हणतात.
          पण हे शककर्ते राजे कोण होते? या कालगणनेविषयी आणि शककर्त्यांविषयी गेल्या काही वर्षांत आणखी एक मतप्रवाह पुढे आला आहे. शालिवाहन राजाने ही कालगणना सुरू केली नसून शकांनीच सुरू केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.
          २००० वर्षांपूर्वी उत्तर भारतात सातत्याने परकीय टोळ्यांची आक्रमणं व्हायची. याच परकीय टोळ्यांपैकी एक असलेल्या शकांनी तत्कालीन सातवाहन साम्राज्यावर हल्ला केला. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा पराक्रमी राजा त्यावेळी सत्तेवर होता. गौतमीपुत्र असं नाव लावणारे राजे त्या वेळच्या मातृसत्ताक पद्धतीचे अनुकरण करणारे असल्याचेही काही अभ्यासक मानतात.
      गौतमी ही शकांबरोबरच्या एका युद्धात हरलेल्या आणि धारातीर्थी पडलेल्या राजाची पत्नी होती . ती रानावनात अत्यंत हालाखीत रहात होती. सातवाहनाने मातीचे घोडे व शिपाई करून त्यांच्याकरवी शकांचा पराभव केला, अशी दंतकथा आहे. या दंतकथेचा अर्थ मी असा करतो – “शक लोकांचा अंमल महाराष्ट्रावर दोन हजार वर्षांपूर्वी जुन्नर वगैरे स्थळी राज्ये स्थापून जेव्हा झाला, तेव्हा महाराष्ट्रातील लोक मातीप्रमाणे निर्वीर्य व हतप्रभ झाले होते.  तिने आपल्या मुलात शौर्याचे स्फुल्लिंग जागवून सामान्य - वनवासी लोकांतून सैन्य निर्माण केले, शकांचा पराभव करवला अशा लोकांना उत्तेजन देऊन पैठणच्या सातवाहन राजाने शकांचा उच्छेद केला.आणि त्याला पुन्हा राजा बनवले. ज्या दिवशी त्याने विजयी योद्धा म्हणून पैठणच्या राजधानीत प्रवेश केला त्या दिवशी तेथील प्रजेने गुढ्या-तोरणे उभी करून त्याचे स्वागत केले. हीच प्रथा आपण गुढीपाडव्याला पाळतो. तेंव्हापासून "शालिवाहन शके"(शक पराभव संवत्सर) अस्तित्वात आले.
     छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या करवी जसा मोगलांचा पराभव केला तसा. शकांच्या या पराभवाला उद्देशून या कालगणना पद्धतीस “शालिवाहनकृत शकपराभवकाल’ असे त्या वेळी लोक म्हणू लागले व “शालिवाहन शककाले’ असा प्रयोग होऊ लागला. “शालिवाहनशक’ या सामासिक शब्दाचे “शालिवाहन शक’ असे विशेषण होते. नंतर कालांतराने या लांबलचक सामासिक शब्दाचा संक्षेप “शककाले’, “शकवर्षे’, “शके’ असा उत्तरोत्तर होत गेला – तेव्हा शालिवाहन शककाल आपणा मराठ्यांचा मोठ्या अभिमानाचे द्योतक आहे.” असे एके ठिकाणी प्राख्यात इतिहासकार राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे.

सातवाहन कि शालिवाहन ? : -

           शकांपासून महाराष्ट्राला मुक्त केले हे गौतमीपुत्राचे महाराष्ट्राच्याच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासातले सर्वात महान कार्य. या स्वातंत्र्योत्सवाचे स्मरण चिरकाळ राहावे म्हणून त्याने नवीन सालाहन संवत्सर त्या दिवशी सुरु केले.
     सातवाहन हे नांव कसे व कोठून आले याबाबत विद्वानांनी खूप वाद घातला आहे. सातवाहन हे घराणे नंतर सातकर्णी नांवानेही ओळखले जाऊ लागले. शिलालेखांत या वंशाचे नांव सादवाहन, सदकनी असेही आले असे असून संस्कृत ग्रंथांत सातवाहन, सातकर्णी, शातवाहन असेही आले असले तरी या नांवाची व्युत्पत्ती काय हे मात्र कोडेच आहे असे डा. अजयमित्र शास्त्री म्हणतात. वाहने वाटतो म्हणून सातवाहन असे जसे म्हटले जाते तसे जे. प्रिझलुक्सी यांच्या मताप्रमाणे "सादम" या मुंड भाषेतील शब्दावरुन हा शब्द आला आहे व त्याचा अर्थ घोडा असा होतो. अशा अनेक व्युत्पत्त्या शोधायचा प्रयत्न राजवाडेंपासून के. गोपालाचारींनी केला असला तरी या नांवाची उत्पत्ती लागलेली नाही. कारण सर्व विद्वानांनी संस्कृतात या शब्दाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला आहे. इसवीसनापुर्वी मुळात संस्कृत भाषाच तयार झालेली नव्हती तर संस्कृतात त्याची उत्पत्ती सापडेल कशी? (पहा- भाषेचं मूळ-संजय सोनवणी ) वा. वि. मिराशी म्हणतात कि, सातवाहन हेच मुळचे नांव असून त्याची व्युत्पत्ती काहीही असो. या वंशनामाच्या इतर व्युत्पत्त्या काल्पनिक आहेत. (सातवाहन आणि पश्चिमी छत्रप)
        शालिवाहन म्हणजेच सातवाहन. शालिवाहन हे संस्कृतीकरण आहे. साळीहन हे मूळ प्राकृत भाषेतलं नाव. जैन साहित्यामध्ये सालाहन असे म्हटले आहे. त्याचे संस्कृतीकरण जेव्हा झाले, तेव्हा ते शालीवाहन झाले," असे शालिवाहन साम्राज्याचे अभ्यासक इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी एका मुलाखतीत बोलताना उल्लेख केला होता.
    तर प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. 
   अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.
   
 शक संवत्सर, गुढी, आणि नववर्ष यांचा संबंध कसा आला असावा याविषयी: -

 शालिवाहन नामक कुठलाच राजा कधीच अस्तित्वात नव्हता. सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं. राहिता राहिली एकच खरी गोष्ट की त्यांचा सर्वात बलाढ्य राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहरात कुलातील नहपान नामक अतिशय पराक्रमी शक राजाचा निर्णायक पराभव केला आणि ते राजकुल कायमसाठी संपवलं. मात्र या युद्धाचाही निश्चित असा संबंध शक संवत्सराशी नाही. एकूण पुरावे बघता शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे ( शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक शकासारखं ) असं दिसतं. या कुलाने गुजरात आणि माळवा प्रांतामधे अनेक वर्षं राज्य केल्यामुळे तेच आसपासच्या प्रदेशांमधे प्रचलित झालं. त्यामुळे त्याचा उल्लेख शक-काल असा केला जाऊ लागला आणि हळूहळू शक हाच शब्द कालगणनावाचक म्हणून रूढ झाला.
      प्रत्यक्ष शालिवाहन शकाचा विचार करता त्याच्याबद्दलच्या माहितीत गुढी पाडव्याचा काहीही उल्लेख येत नाही. पण काळाच्या ओघात कधीतरी त्यांचा एकमेकांशी संबंध जोडला गेला असे दिसते. शालिवाहन शक नावाचा संवत्सर कोणी स्थापन केला याबाबत परंपरेत दुमत नाही. शालिवाहन राजाने इ.स. ७८ मध्ये शक राजाचा पराभव केला तेव्हा हा संवत्सर सुरू झाला असे सर्वमान्य मत आहे. परंतु हा संवत्सर कनिष्क या राजाने सुरू केला असे बरेच विद्वान मानतात. पुढे त्याचे जे शक अधिकारी होते, त्यांनी तो वापरला आणि म्हणून त्याला शक संवत्सर हे नाव पडले. परंतु प्रत्यक्ष पुरावे पाहून या सर्व विधानांचा खोलवर आणि तपशिलात विचार करावा लागतो. सातवाहन राजांचा इतिहास पाहून त्या काळात कोण शक राजे होते आणि त्यापैकी नेमक्या कोणाचा पराभव केला हेसुद्धा पडताळून पाहावे लागते.  
         निरनिराळ्या मतांमधून आतापर्यंत झालेल्या इतिहासातील संशोधनातून जे काही पुरावे पुढे आले आहेत त्यामध्ये शिलालेख, नाणी, परकीय प्रवाशांची वर्णने या सर्वाचा समावेश करावा लागतो, तसेच ऐतिहासिक पुरावा हा परंपरेतील पुराव्याशी पडताळून पाहावा लागतो. त्यानंतर एक वेगळेच चित्र डोळ्यांसमोर येते. या शालिवाहन शक संवत्सराशी संबंधित कथेमध्ये काही घराणी, काही राजे यांचा समावेश आहे. ते कोण याची आधी माहिती घेऊ. यामध्ये सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी, क्षहारात क्षत्रप राजा नहपान आणि कार्दमक क्षत्रप राजा चष्टन यांचा समावेश होतो. साधारणपणे इ.स. पूर्व पहिल्या शतकातील गोष्ट आहे. पर्शिया म्हणजे प्राचीन इराण येथील सिथिया नावाच्या प्रांतातील काही अधिकारी हळूहळू स्थलांतर करत सिंध आणि राजस्थान या परिसरात आले. पुढे त्यांनी तिथे आपले राज्य प्रस्थापित केले. या लोकांना भारतीयांनी शक या नावाने संबोधले. त्यांनी पुढे राज्यविस्तार करायला सुरुवात केली. त्यांच्यापैकी नहपान नावाचा राजा खूपच बलाढय़ होता. त्याला दक्षमित्रा नावाची मुलगी होती. तिचा पती उषवदात हा त्याचा सेनापती होता. या दोघांनी आपला राज्यविस्तार करायला सुरुवात केली. ते गुजरातमधून राज्य करत असताना पुढे त्यांनी उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर ताबा मिळवला. तिथे राज्य करत असलेल्या सातवाहन राजांना त्यांनी पराभूत केले. सातवाहन तेव्हा पूर्व महाराष्ट्राच्या भागात राज्य करू लागले आणि त्यांनी नंतर आंध्र प्रदेशमध्येही आपला राज्यविस्तार केला.
        नहपान पश्चिम महाराष्ट्रावर राज्य करू लागला, त्या वेळेस त्या परिसरातील बौद्ध भिक्षूंना त्यांनी काही गुहांचे दान दिले. तसेच त्या गुहांमध्ये लेखही कोरवले. अशा काही गुहा नाशिक, कार्ले, जुन्नर या परिसरात कोरलेल्या दिसतात. त्यामध्ये ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत कोरलेले लेखही आहेत. अशा पद्धतीने क्षहारात क्षत्रप राजांनी पश्चिम भारतावर अंमल तर प्रस्थापित केलाच, पण त्या काळात जो भारत आणि युरोप यांच्यामध्ये सागरी व्यापार सुरू होता त्यावरही आपला ताबा मिळवला. पश्चिम भारतातील व्यापारी मार्गावरही ताबा मिळवून त्यांनी कर वसुलीला सुरूवात केली. थळघाट, नाणेघाट यांसारख्या व्यापारी मार्गावर त्यांचे राज्य असल्यामुळे तेथील जकात आणि इतर कर मिळवून त्यांचे राज्य खूपच श्रीमंत झाले. त्यांनी मोठय़ा संख्येने चांदीची नाणी पाडली. त्यावेळेस सातवाहनांची मात्र तांब्याची आणि शिशाची नाणी होती. त्यांच्या राज्याचा बराच मोठा भाग क्षत्रपांनी जिंकून घेतला होता. 
नाशिक येथील गौतमीपुत्र सातकर्णी याचा लेख असलेली गुहा
नाशिक येथील नहपानाचा जावई उषवदात याचा लेख असलेली गुहा
      पुढे सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहारात क्षत्रप राजा नहपान याच्याशी नाशिकजवळील गोवर्धन या ठिकाणी मोठे युद्ध केले. त्या युद्धात नहपानाचा दारुण पराभव झाला आणि क्षहारात वंश 'निरवशेष' झाला. गोवर्धनाच्या विजय स्कंधावारातून गौतमीपुत्राने नाशिक येथील गुहेत राहणााऱ्या भिक्षूंना काही जमीनही दान दिली, ज्यावर पूर्वी नहपानाची मालकी होती. नहपानाची बाजारात प्रचलित असलेली सर्व नाणी गोळा करून त्याने त्यावर स्वत:चे नाव आणि चिन्हे उमटवली. अशी हजारो पुनर्मुद्रांकित नाणी नाशिकजवळील जोगळटेम्बी या ठिकाणी सापडली आहेत. नंतर गौतमीपुत्राच्या मुलाच्या म्हणजे वासिष्ठीपुत्र पुळूमाविच्या नाशिक येथील लेखात या सर्व घटनांची सविस्तर माहिती दिली आहे. ही घटना इ.स.७८ मध्ये घडली असावी, ज्या वेळेस गौतमीपुत्राचे राज्य वर्ष १८ आणि नहपानाचे राज्य वर्ष ४६ होते. त्या काळात राजे स्वत: गादीवर आल्यावर नवीन संवत्सर सुरू करीत, तो त्यांचे राज्य वर्ष असे.
  ( काही अभ्यासकांच्या मते शक बाहेरचे आक्रमक होते वगैरेही तितकंसं खरं नाही. ते मध्य आशियातून काही शतके आधी आले असावेत असं पुरावे दर्शवतात. पण शक-क्षत्रप आणि सातवाहनांची राज्ये शेजारी शेजारी होती आणि त्यांच्यात व्यापारीमार्गाच्या नियंत्रणासाठी वगैरे कायमच चुरस होती आणि लढाया होत असत. त्यामुळे परकीय आक्रमकांचा पराभव करण्यासाठी गौतमीपुत्राने ती लढाई केली या म्हणण्यात तथ्य नाही. तसेच कार्दमक कुलाशी सातवाहनांचे सोयरिकीचे संबंध होते. त्यांच्या एका राजकन्येशी वासिष्ठीपुत्र पुळुमावि या राजाचे लग्न झालेले होते. याउपर सातवाहनांनी कार्दमकांकडूनही पराभवाचे पाणी चाखले होतेच. या सगळ्या 
 राजकीय वर्चस्ववादातून ( 'जिओपोलिटिकल' ) कारणासाठी झालेल्या स्थानिक महत्वाच्या लढाया होत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त तो गौतमीपुत्राचा विजय मात्र खरंच पश्चिम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आठवणींमधे पक्का रुजला. त्याविषयी अनेक दंतकथेची पुटं चढली. आणि मग कधीतरी या पाठोपाठ झालेल्या घटनांचं (नहपानाचा पराभव आणि चष्टनाचं राज्यारोहण) सांस्कृतिक स्मृतीमधे एकीकरण होऊन शक संवत्सराशी शालिवाहन शब्द जोडला गेला. ) 
          नहपानाच्या मृत्यूनंतर त्याचे गुजरातमधले राज्य सातवाहनांनी घेतले नाही, तर शक क्षत्रप लोकांपैकीच दुसरे घराणे गादीवर आले. त्यांचे नाव होते कार्दमक. त्यांचा एक चष्टन नावाचा राजा गादीवर आला. त्याने राज्यावर बसल्यापासून जो संवत्सर सुरू केला तो त्याच्या वंशजांनीही पुढे सुरू ठेवला. त्यांनी तो पुढे जवळजवळ ३०० वर्षे वापरला. त्यामुळे त्या संवत्सराचा उपयोग करणे लोकांना सोपे जाऊ लागले. पुढे 'शक राजांचा संवत' या नावाने तो प्रसिद्ध झाला. वाकाटक राज देवसेन याच्या विदर्भातील हिस्सेबोराळा येथील लेखामध्ये सर्वप्रथम याचा 'शकांचा ३८०' असा उल्लेख सापडतो. त्यानंतर चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या ऐहोळे प्रशस्तीमध्येही शक राजांचा काल असा उल्लेख सापडतो. त्यामुळे शक राजांनी सुरू केलेली कालगणना आम्ही वापरत आहोत हे सर्वानी स्पष्ट सांगितले आहे. या सर्व लेखांमध्ये 'शक' शब्दाचा अर्थ संवत्सर असा नसून त्या लोकांचे नाव असा आहे. येथे कुठेही हा सातवाहनांचा संवत्सर आहे असे म्हटले नाहीये. 
      प्राचीन भारतीय लोकपरंपरा मात्र असे सांगते की शालिवाहनानी शकांचा पराभव केल्यावर हा संवत सुरू झाला किंबहुना तो सातवाहनांनीच सुरू केला. पण त्यांनी तो अजिबात वापरला नाही असे दिसते. कारण गौतमीपुत्र सातकर्णीनंतर त्याचा मुलगा जेव्हा गादीवर आला, तेव्हा त्याने स्वत:चा नवीन राज्य संवत्सर सुरू केला. तसेच खुद्द गौतमीपुत्रानेही तो कधी वापरला नाही. वापरायचा नव्हता तर कशाला सुरू केला असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. पण खरा इतिहास पाहिला तर असे दिसते की सातवाहनांनी एका शक राजाला म्हणजे नहपानाला हरवले तेव्हा दुसरा शक राज म्हणजे चष्टन गादीवर आला. त्याने जो संवत्सर सुरू केला, तो पुढे सलग ३०० वर्षे वापरला गेला आणि 'शक राजांचा संवत' या नावाने इतर अनेक राजांनी तो वापरला, कारण दरवर्षी नवीन राज्य वर्ष देण्यापेक्षा हे जास्त सोयीचे होते. तो इतका लोकप्रिय झाला की पुढे शक या शब्दाचा अर्थ संवत्सर असा घेतला जाऊ लागला. त्यानंतर तो भारतभर, एवढेच नव्हे तर आग्नेय आशियातही काही देशांमध्ये वापरला जाऊ लागला.
  ( काही अभ्यासकांच्या मते चष्टनाने स्वतःचे राज्यगणना वर्ष सुरु केले हे काहीसे असंभवनीय वाटते कारण चष्टन हा स्वतंत्र राजा नसून क्षत्रप होता. अर्थात क्षत्रपाचा स्वामी सामर्थ्यशाली राजा नसल्याने तो स्वतंत्र झाला होता. अर्थात कोणत्याच प्राचीन संवतांचे (शक्/विक्रम)उल्लेख संस्थापकाच्या नावाने येत नाहीत, तर ते कालांतराने प्रचलित होतात. ह्याच वेळी त्याचा समकालीन असलेल्या नहपानाच्या लेखातही संवताचा उल्लेख आहे ह्याचाच अर्थ चष्टन किंवा नहपान यांचा अधिपती असलेल्या कुणा प्रभावी राजाने हा संवत सुरु केला असला पाहिजे. तो म्हणजे कुशाण वंशीय कनिष्क. कनिष्क हा संवताचा संस्थापक असावा हे मत फर्ग्युसनने मांडले. कनिष्काने आपल्या विशाल भूभागाच्या शासनार्थ विविध क्षत्रपांची नेमणूक केली. कार्दमक, क्षहरात, भूमक ही क्षत्रपांची कुळेच. कनिष्काने आपला संवत सुरु केला होता व हुविष्क्, वासुदेव इत्यादी त्याच्या वंशजांनी तो सुरु ठेवला होता व त्याच्या क्षत्रपांनी देखील त्याचे निष्ठेने पालन केले. कुशाण कमजोर झाल्यावर क्षत्रप स्वतंत्र झाले, मात्र त्यांनी हेच संवत पुढे प्रचलित ठेवल्याने शक हे नामाधिमान त्याला चिकटले असावे असे मानता यावे.
      मात्र कनिष्काने शक संवत सुरू केला हे जुनं मत आहे. हे मत आता विश्वसनीयरीत्या मोडीत निघाले आहे. हॅरी फाल्क यांनी आता कनिष्काच्या राज्यारोहणाचे वर्ष इ स १२७ असावे असे मत मांडले आहे आणि ते बहुतांशीरीत्या मान्य झालेले आहे. ज्यांचे याविषयी मतभेद आहेत तेही कनिष्काने शक संवत सुरू केला हे आता म्हणत नाहीत. )
गौतमीपुत्र सातकर्णीने स्वतःची चिन्हे उमटविलेले नहपानाचे पुनर्मुद्रांकित नाणे. पुढची बाजू, मागची बाजू  
        त्याकाळी बहुतेक राजे स्वतःच्या राज्यारोहणापासून काळ मोजून तसा अधिकृत दस्तऐवजांमधे (यातील आपल्यापर्यंत फक्त प्राचीन कोरीव लेख आले आहेत) लिहित असत. उदा, सम्राट अशोक आणि ओडिशामधील सम्राट खारवेल यांनी त्यांचे कार्य लिहिताना स्वत:चा राज्यारोहण काळ वापरला आहे - वर्ष अमुकतमुक असा. तशीच कालगणना चष्टनाचीही होती. त्या राजकुलाने गुजरात माळवा भागात पाचव्या शतकापर्यंत राज्य केल्याने तिथे ही कालगणना लोकप्रिय आणि रूढ झाली होती. तशीच ती आसपासच्या प्रदेशांतही रूढ झाली असे दिसून येते. शक-कालाचा सर्वात जुना उल्लेख स्फुजिध्वजाच्या यवनजातकात 'समानाम् शकानाम्' (य.जा. - ७९:१४) आणि कालम् शकानाम्'(य.जा-७९:१५) असा केलेला आढळून येतो. शके १९१ (गत) हा यवनजातकाचा निर्मितीकाळ आहे (य.जा.-७९-६१,६२). शिलालेखांमधे याचा प्रथम उल्लेख 'शक-काल' असा ठाणे जिल्ह्यातील वाला येथील सुकेतुवर्मन नामक भोज-मौर्य राजघराण्यातील राजाच्या शिलालेखात आढळतो. नंतर विदर्भामधील हिस्सेबोराळा येथील देवसेन वाकाटक नृपतीच्या शिलालेखात शकानाम् ३८० असा उल्लेख आढळतो. बदामीचे चालुक्य राजेही शिलालेखांमधे शक-वर्ष, शक-नृपति-राज्याभिषेक-संवत्सर, शक-नृपति-काल असा स्पष्ट उल्लेख करतात. आठव्या शतकातील महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजेही स्पष्टपणे शक-नृप-काल किंवा शक-नृप-संवत्सर असा उल्लेख करतात. एवढेच काय वराहमिहिरानेही बृहत्संहितेत शकेन्द्र-काल आणि शक-भूप-काल असा उल्लेख करून ही कालगणना वापरली आहे.. साधारण नवव्या दहाव्या शतकानंतर याचाच उल्लेख संक्षिप्ताने शक-संवत असा व्हायला सुरू होतो. तो इतका रुळतो की शक याचाच अर्थ कालगणना होतो.इसवी सनाच्या बाराव्या शतकापासून या संवत्सराचा संबंध शालिवाहनांशी जोडला गेलेला दिसतो. तेव्हापासूनच 'शक' या शब्दाचा अर्थही संवत्सर असा झालेला दिसतो. मुळात शक हे समाजातील एका गटाचे नाव आहे याचा लोकांना विसर पडलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या राज्याभिषेकानंतर 'राज्याभिषेक शक' सुरू केला. या नावात 'शक' हा शब्द 'संवत्सर' या शब्दाशी समानार्थी आहे. हीच परंपरा आजपर्यंत सुरू आहे. साधारणपणे इ.स. च्या १२व्या शतकापासून (म.प्र. येथील उदयगिरी येथील परमार राजा उदयादित्याचा शिलालेख,पंढरपूरचा शिलालेख, तासगाव ताम्रपट, इ) या काळाचा उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो. तो पंधराव्या शतकापर्यंत चांगलाच रूढ झालेला दिसतो. शकनृपति काळापासून तो शकांना हरवलेल्या शालिवाहनाचे नाव त्याला जोडले जाईपर्यंत तत्संबंधीच्या मौखिक परंपरेत, कथा/दंतकथांमधे कसे आणि मुख्य म्हणजे का बदल झाले हे आत्ता सांगणे थोडे अवघड आहे. त्यात अनुमानाचा भाग जास्त येऊ शकतो.
हा असा आणि इतर विस्तृत शिलालेखीय पुरावा समुच्चयाने असताना शकसंवत्सराला सुरू करणारा कोण याबद्दल फार काही शंका उरते असे वाटत नाही.
      भारतीय लोकांनी मात्र यामध्ये शालिवाहन राजाने शक राजाला हरविल्याची स्मृती कायम ठेवली, पण संवत्सर सुरू करणारा राजा हा कोणीतरी दुसराच होता हे ते विसरून गेले. त्यामुळे शालिवाहन शक असे नाव त्याला मिळाले आणि तेच वापरले जाऊ लागले. या विजयाप्रीत्यर्थ गुढी तोरणे इ. उभारून तो दिवस साजरा केला जाऊ लागला. पण चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच ही घटना घडली का हे सांगणे आज अवघड आहे. या संवत्सराचा वापर दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातील काही भागात होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी पंजाबी, सिंधी, कन्नड लोकांचेही नवीन वर्ष सुरू होते. मात्र या सर्वाच्या बाबतीत वेगवेगळ्या कथा आणि परंपरा आहेत. पुरावे एवढंच सांगतात. वरचे 'हिंदू' नववर्षाचे, शालिवाहनाने हरवून परतवून लावलेल्या आक्रमकांच्या गोष्टीचे इमले हे बरीच शतके नंतर उभारलेले आहेत.  
(शिवाय आपण दिवाळीत जो किल्ला करतो शिवाजी महाराजांची आठवण म्हणून, ती प्रथा खरंतर शालिवाहनाने मातीचे पुतळे लहानपणी केले त्याची आठवण म्हणून अस्तित्वात आली असं काही जुनी ब्रिटीश गॅझेटीअर्स नोंद करतात. त्याची शिवाजी महाराजांशी असलेली संदर्भ नंतरचा आहे.)
अशा प्रकारे महाराष्ट्रात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाचा इतिहास खूप खोल आणि विस्तारलेलाही आहे.
पुरातन हिंदू कॅलेंडर

 आता शकसंवत्सर नेमका गुढीपाडव्याशी कसा संबंधित हा प्रश्न बाकी आहेच!
          चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला माहित नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली. आणि भविष्यपुराणात पताका, कमानी (म्हणजेच गुढी. गुढीचा अर्थ ध्वज/पताका) उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही म्हणजे मध्ययुगाच्या थोडे आधीचे वगैरे असूच शकतात.
          कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा खरंतर त्या नंतरच आली असणार कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. आणि मग दोन्हीची सांगड बसली असेल.... भारतातील इतर काही प्रदेशात नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं. एकुणच भारतीय पारंपरिक कालगणनेतही प्रादेशिक वैविध्य आहेच. मात्र शकसंवत ही त्यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी कालगणना असावी.
            वेदकाळापासून आपल्याला महिन्याची आणि तिथीची गणना होत असे दिसून येते. वेदातल्या उल्लेखानुसार फाल्गुन पौर्णिमेनंतरच्या दिवसाला नवे वर्ष सुरू होत असे म्हणे. ही चांद्रमासीय कालगणना होती आणि पाच वर्षांच्या कालावधीत दोनवेळा अधिकमास मिळवला जात असे. मात्र कशा पद्धतीने त्याचे तपशील आपल्याकडे नाहीत. मुळात वैदिक विचारांनुसार चैत्र हा पहिला महिना नाहीच..मार्गशीर्ष हा आहे. मग चैत्र हा महिना पहिला कसा झाला असावा? विषुवदिनाच्या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्ताला ९० अंशामध्ये येतो, तेव्हापासून आपल्याकडचा प्रसिद्ध वसंत ऋतू सुरु होतो आणि हा ऋतू नेहमीच सर्व ऋतुंमध्ये पहिला येतो (ऋतुगणनेची सुरुवात वसंत ऋतू पासून होते) अगदी कालिदासाच्या ऋतुसंहार मध्ये सुद्धा! भगवद्गीतेमध्ये स्वतः कृष्ण म्हणतो “मासानां मार्गाशिर्षोsहमृतुनां कुसुमाकरः” – सर्व महिन्यांत मार्गशीर्ष (श्रेष्ठ) मी आहे..आणि सर्व ऋतूंत वसंत (श्रेष्ठ ऋतू) मी आहे! 
  शिवाय काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. उत्तरेत दिवाळी पाडव्याला राम आयोध्येत आला असे मानतात, आणि आपल्याकडे गुढीपाडव्याला... ह्या गोष्टी कशा रूढ झाल्या?
          गेले किमान अडीच तीन सहस्रके भारतीय उपखंडांमधे विविध लोकसमूह येतजात आहेत, एक सांस्कृतिक घुसळण कायमच चालू राहिलेली आहे. आक्रमक म्हणून खूप कमी आले. स्थलांतरे करणारे खूप होते. ज्या कुठल्या कारणाने असो, जे आले ते इथलेच झाले. त्यांना आधीच्या इथल्या समाजांनीही खुल्या मनाने स्वीकारले. दुर्दैव असे की त्यांचेच वंशज आपण मात्र आपल्या परंपरांमधे असे बहुपेडित्च असू शकते, आपल्याला माहित असलेल्या 'हिंदू धर्म परंपरांच्या' आणि 'पारंपरिक दंतकथांच्या' बाहेर जाणारे सत्य असू शकते, ऐतिहासिक पुराव्यांनी ते सिद्ध झालेले असते आणि या तथ्यांच्या स्वीकाराने आपल्या संस्कृतीला कुठे उणेपणा येत नाही तर उलट अतिशय समृद्धी आणि संपन्नताच येते हे विसरून गेलो आहोत...
           शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्‍या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अ‍ॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे. हे संवतही माळवा, राजपुताना आदी भागातील शकांनी प्रचलित ठेवले, पुढे शेकडो वर्षांनी चंड्रगुप्त दुसरा अर्थात विक्रमादित्य ह्याने वाकाटक नृपतीची मदत घेऊन तृतीय रूद्रसिंह क्षत्रप याचे राज्य अनुमाने सन ३९५ मध्ये संपूर्णतः खालसा केले व क्षत्रपांच्या भरुकच्छ (भडोच) या राजधानीवर कब्जा केला व माळवा तसेच उत्तर भारत आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या ह्या पराक्रमामुळेच अ‍ॅझेसने सुरु केलेल्या संवताला विक्रम हे नाव चिकटले असावे.
गुढीपाडव्याच्या म्हणजे गुढी उभारण्याच्या प्रथेचे प्राचीन साहित्यात आलेल्या वर्णनांबाबत आता माहिती घेउया. 
हा सण प्राचीन काळात इंद्रोत्सव किंवा शक्रोत्सव ह्या नावाने प्रचलित होता आणि ह्या उत्सवात इंद्राची पूजा केली जात असे. कळकाच्या काठ्या उभारल्या जात आणि त्याला इंद्रध्वज असे म्हणत असत.
महाभारतातल्या आदिपर्वात इंद्रध्वजाचे वर्णन पुढीलप्रकारे आले आहे.
          उपरिचर नामक एका धर्मनिष्ठ राजा आपल्या तपोबलाने इन्द्रपदासही योग्य झाला असे वाटून देव त्याच्यापुढे प्रकट झाले व त्यास म्हणाले की तू पृथ्वीचे राज्य कर, इंद्राने त्याला चेदी देशाचे राज्य दिले व त्याला एक दिव्य विमान, ज्यातील कमळे कधीच कोमेजत नाहीत व जी परिधान केल्यावर कुठल्याही शस्त्रांपासून भीती नाही अशी एक दिव्य इंद्रमाला त्यास दिली आणि...

यष्टिं च वैणवीं तस्मै ददौ वृत्रनिषूदनः |
इष्टप्रदानमुद्दिश्य शिष्टानां परिपालिनीम् ||

तस्याः शक्रस्य पूजार्थं भूमौ भूमिपतिस्तदा |
प्रवेशं कारयामास गते संवत्सरे तदा ||

ततः प्रभृति चाद्यापि यष्ट्याः क्षितिपसत्तमैः |
प्रवेशः क्रियते राजन्यथा तेन प्रवर्तितः ||

अपरेद्युस्तथा चास्याः क्रियते उच्छ्रयो नृपैः |
अलङ्कृतायाः पिटकैर्गन्धैर्माल्यैश्च भूषणैः ||

माल्यदामपरिक्षिप्ता विधिवत्क्रियतेऽपि च ||

भगवान्पूज्यते चात्र हास्यरूपेण शङ्करः |
स्वयमेव गृहीतेन वसोः प्रीत्या महात्मनः ||

एतां पूजां महेन्द्रस्तु दृष्ट्वा देव कृतां शुभाम् |
वसुना राजमुख्येन प्रीतिमानब्रवीद्विभुः ||

ये पूजयिष्यन्ति नरा राजानश्च महं मम |
कारयिष्यन्ति च मुदा यथा चेदिपतिर्नृपः ||

तेषां श्रीर्विजयश्चैव सराष्ट्राणां भविष्यति |
तथा स्फीतो जनपदो मुदितश्च भविष्यति ||

एवं महात्मना तेन महेन्द्रेण नराधिप |
वसुः प्रीत्या मघवता महाराजोऽभिसत्कृतः ||

उत्सवं कारयिष्यन्ति सदा शक्रस्य ये नराः |
भूमिदानादिभिर्दानैर्यथा पूता भवन्ति वै ||

वरदानमहायज्ञैस्तथा शक्रोत्सवेन ते ||

सम्पूजितो मघवता वसुश्चेदिपतिस्तदा |
पालयामास धर्मेण चेदिस्थः पृथिवीमिमाम् ||

इन्द्रप्रीत्या भूमिपतिश्चकारेन्द्रमहं वसुः ||

(महाभारत भांडारकर संशोधित प्रत १.५७)

...आणि नंतर इंद्राने उपरिचर राजाला आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणून एक वेळूची (बांबू/कळक) काठी दिली. इंद्राने प्रदान केलेल्या वस्तूंना स्मरुन राजानेही तो संवत्सर संपण्याच्या दिवशी ती काठी जमिनीत पुरुन ठेवली. ही चाल अद्यापिही राजेलोकांत सुरु आहे. नंतर नवीन वर्षाच्या प्रथम दिवशी त्या काठीला वस्त्रभूषणे, गंधपुष्पे इत्यादिकांनी अलंकृत करुन उंच उभारितात आणि वसुराजाप्रीत्यर्थ धारण केलेल्या हंसरूपी ईश्वराची या यष्टीद्वारा विधीपूर्वक मोठ्या आदराने पूजा करतात. आपला हा उत्सव वसुराजाने प्रचलित केलेला पाहून त्या चक्रवर्ती राजावर इंद्राचा अनुग्रह होऊन त्याने असा वर दिला की "जे नृप व जे लोक चेदीराजाप्रमाणे माझा उत्सव व पूजा करतील त्यांचा सदैव विजय होत जाऊन त्यांचे राज्य अखंड संपन्न होईल व त्यांच्या प्रजाजनांचेही कल्याण होऊन ते नेहमी संतुष्ट राहतील" याप्रमाणे त्या उदार महेन्द्राने चेदीराजाचा उत्तम सत्कार केला.

तर वराहमिहिराच्या बृहदसंहितेत इंद्रध्वजाचे वर्णन पुढीलप्रमाणे आले आहे.

उपरिचरस्यामरपो वसोर्ददौ चेदिपस्य वेणुमर्याम |
यष्टिं तां स नरेन्द्रो विधिवत् सम्पूजयामास ||

(इन्द्रध्वसम्पद् ४३)

एकदा इंद्राने चेदी देशातील राजाला जो उपरिचर वसु या नावाने विख्यात होता त्याला एक कळकाची काठी दिली तो राजा त्या काठीची विधिवत पूजा करत असे.

बृहद्संहितेतील काही श्लोकांचे वर्णन महाभारतातील वर्णनाप्रमाणेच आलेले आहेत. मात्र ह्या व्यतिरिक्त ही यष्टी कशी आणावी ह्याचे अधिकचे वर्णनही बृहद्संहितेत येते.

उद्यान देवतालय पितृवन वल्मीकमार्ग चितिजाताः।कुब्जोर्ध्वशुष्क कण्टकिवल्लीवन्दाक युक्ताश्च ॥
बहुविहगालय कोटरपवनानल पीडिताश्च ये तरवः। ये च स्युः स्त्रीसंज्ञा न ते शुभाः शक्रकेत्वर्थे ॥

एक ज्योतिषी आणि एका सुताराने शुभदिवस, नक्षत्रे पाहून मंगल मुहूर्तावर जंगलात प्रस्थान करावे, जी झाडे उद्यानात, देवळांत, स्मशानांत, वारुळांत, रस्त्यांवर, यज्ञीय स्थळी लावली जातात, जी बुटकी आहेत, माथ्यावर खुडलेली आहेत, काटेरी आहेत, परजीवी वेलींनी ज्यांना वेढा घातलेला आहे, ज्यांच्यावर असंख्य पक्ष्यांचा निवास आहे, त्यांची घरटी आहेत, जी पोकळ आहेत, ज्यांचे वारा आणि आगीमुळे नुकसान झाले आहे आणि ज्यांची नावे स्त्रीसूचक आहेत अशी सर्व झाडे ह्या साठी वर्ज्य समजावीत.
वराहमिहिर पुढे म्हणतो,
         अर्जुन, अजाकर्ण (चंद्रुस), प्रियक, धव (धामोरा/धावडा), उंबर ह्या झाडांचे लाकूड ध्वजासाठी उत्तम समजावे. त्या वृक्षाची स्तुती करावी- हे महान वृ़क्षा, तुझ्यात निवास करणार्‍या सर्व जीवांना नमन असो, राजाने तुला ह्या देवेन्द्राचा ध्वज म्हणून निवडले आहे, कृपया या पूजेचा स्वीकार करावा.
         यानंतर भल्या पहाटे सुताराने पूर्व किंवा उत्तर दिशेस सन्मुख होऊन हे झाड कापण्यास आरंभ करावा किरकिर आवाज करत न कापता हळूवार पण एकच वारात हे काम करावे. जर तो वृक्ष एकाच फटक्यात इतर वृक्षांना इजा न देता शिवाय स्वतःचेच नुकसान न होऊ देता पडला तत तो राजाला विजय देईल. याविपरीत वृक्ष पडला तर तो ध्वजासाठी त्याज्य समजावा. हा वृ़क्ष वरील बाजूस चार अंगुळे तर खालील बाजूस आठ अंगुळे इतका ठेवून साफ करावा व त्याचे खोड पाण्यात बुडवून ठेवावे व यांनतर तो मनुष्यांकरवी अथवा रथातून गावाच्या वेशीवर आणावा.
          भाद्रपदाच्या शुक्ल पक्षात राजाने नगरजन, सचिव, पुरोहित यांसह नवे कपडे धारण करुन शंख आणि वाद्ये वाजवत ध्वजास सामोरे जावे. सर्व नगर स्वच्छ करुन ध्वज, पताका, तोरणे, पानाफुलांच्या माळा यांनी सजवावे. यष्टी आणताना ती जर हत्तीं किंवा इतर प्राण्यांद्वारे पडल्यास तो अपशकुन समजावा. मुलांनी टाळ्या वाजवल्यास किंवा प्राणी एकमेकांशी भांडू लागल्यास भविष्यात युद्ध होईल असा अपशकुन मानावा. नंतर राजसुताराने ती यष्टी एखाद्या चौथर्‍यावर आडवी ठेवावी व राजाने अकराव्या दिवशी रात्री तिचे निरिक्षण करावे. नंतर बाराव्या दिवशी ब्राह्मणांना गूळ, दूध दक्षिणा देऊन ध्वज उभारावा. ध्वजाला विविध रंगांतील अलंकारांनी अलंकृत करावे यातले काही अलंकार पुढीलप्रमाणे- अशोकाचे रक्तवर्णी फूल, विविध रंगांचे पट्ट, मसूरक, मोराची पिसे, कमलपुष्प इत्यादी. हा ध्वज ४ दिवस तसाच ठेवून विविध सूक्तांद्वारे त्याची पूजा करावी. पाचव्या दिवशी हा इंद्रध्वज राजाने त्याच्या अमात्यांसह येऊन उतरवावा.
उपरिचर वसुने प्रचलित केलेल्या व इतर राजांद्वारे अनुसरण केल्या गेलेल्या ह्या प्रथेचे जो राजा यथाविधी पालन करेल त्याला शत्रूंकडून कुठलेही भय राहणार नाही.
           अर्थात बृहद्संहितेत शक्रोत्सवाच्या वर्णनात चैत्र महिन्याचा उल्लेख न येता भाद्रपद महिन्याचा उल्लेख आलेला आहे शिवाय सुरुवातीला कळकाचा (बांबूचा) उल्लेख असला तरी नंतर इतरही वृ़क्ष काठीसाठी योग्य समजले आहेत. जंगलात जाऊन लाकूड आणणार्‍या प्रथेचे आजही येथील बगाड यात्रेत पालन होताना दिसते. बगाडासाठीचे लाकूड आणायला लोक जंगलांत जातात. हिंजवडीतल्या बगाडाचे लाकूड मुळशी खोर्‍यातल्या बार्पे ह्या दुर्गम गावी जंगलात जाऊन वाजतगाजत आणले जाते. बगाडाच्या यात्रा चैत्र महिन्यात होतात हे उल्लेखनीय आहे. 
          महाभारतातील खिलपर्वात -हरिवंशात (खिलपर्व मूळ महाभारताचा भाग समजले जात नाही) इंद्रोत्सव न करता गोवर्धन पर्वताची पूजा करावी असे गोकुळातल्या लोकांना सांगतांना कृष्ण म्हणतो की "सांप्रत शरद ऋतूचा काल प्राप्त झालेला आहे.हा ऋतू लागला म्हणजे मेघ कमी होऊन जलाशयातील पाणी कमी होऊ लागते. तुम्ही ह्या गोवर्धन गिरीचे पूजन करुन त्याला संतुष्ट करा."
त्यानंतरची कथा सर्वांना माहिती आहेच. इंद्राचे गर्वहरण झाल्यावर तो श्रीकृष्णाला म्हणतो, "पावसाळ्याचे माझे चार महिने आहेत. ते त्यातील शेवटचे शरदऋतूचे दोन महिने मी तुला अर्पण करेन अर्धा पावसाळा झाल्यावर माझी कालमर्यादा व पूजा समाप्त करुन लोक तुझी पूजा करतील, आकाश निर्मल होऊन मेघ नाहीसे होतील, धान्य उत्पादन वाढेल, ध्वजाकार यष्ट्या उभ्या करुन अखिल लोक तुझे व माझे महेन्द्र आणि उपेन्द्र या नावांनी पूजन करतील"
          रामायणात मात्र  इंद्रध्वजाचा उल्लेख मिळाला नाही, रावणाचा वध करुन राम अयोध्येस परत येतो तेव्हा देखील तिथीचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही, इतर कुठल्या प्रतींत आहे का ते बघायला हवे.
वराहमिहिराची बृहद्संहिता व खिलपर्वातील ह्या उल्लेखांमुळे इंद्रध्वजाची पूजा भाद्रपद महिन्यात प्रचलित होती हे सहज लक्षात यावे मात्र महाभारतातील त्याचा उल्लेख मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीस काठीची/इंद्रध्वजाची पूजा करावी असा येतो. आदिपर्वात इंद्रध्वजपूजेचे संक्षिप्त वर्णन आलेले असून वराहमिहिराने मात्र ते अगदी तपशील्वार नोंदवले आहे. महाभारत काळात इंद्रोत्सव हाच नववर्षाचा दिन मानला जात असे की नाही ते कळत नाही. भाद्रपदातील हा शक्रोत्सव नंतर कधीतरी कुशाण कालखंडात कनिष्काच्या राज्यारोहणसमयी चैत्र महिन्यात परिवर्तीत झाला असावा व मूळ इंद्राच्या उत्सवाचे त्याचे रूप लयास जाऊन केवळ नवीन संवत्सराचे स्वागत करुन त्याच्या आगमनाप्रीत्यर्थ ध्वजरुपी काठ्या अर्थात गुढी उभारण्यात सुरु झाले असावे असा तर्क मांडला जातो.

 वासिष्ठीपुत्र पुळुमावी :-

             इ. स. ७२ ते इ. स. ९५ या आपल्या २४ वर्षांच्या कारकीर्दीत शकआक्रमणाचा निःपात करून व सातवाहन साम्राज्यसत्ता पुन्हा दृढ व समर्थ करून गौतमीपुत्र मृत्यू पावला. त्याच्या मागून त्याचा पुत्र वसिष्ठीपुत्र स्वामी श्रीपुलुमायी हा गादीवर आला. तोही पित्यासारखाच पराक्रमी होता. गौतमीपुत्रानंतर इ.स. १३२ मध्ये त्याचा ज्येष्ठ पुत्र पुळूमावी हा राजगादीवर आला. त्याच्या आईचे गोत्र वासिष्ठी असल्याने त्याला वाशिष्ठीपुत्र म्हणले गेले आहे. काही ठिकाणी त्याचा उल्लेख ' शिवश्री पुळूमावी ' असाही येतो. त्याने जवळपास २८ वर्षे राज्य केले. सातवाहनांच्या विशाल साम्राज्यावर एकछत्री अंमल करणारा पुळूमावी हा अखेरचा सम्राट.
टोलेमी च्या भुवर्णनाप्रमाणे त्याची राजधानी होती पैठण. पुळूमावीला नावनरस्वामी, दक्षिणापथेश्वर, दक्षिणापथस्वामी अशी बिरुदे लावलेली दिसतात.
     त्याने सातवाहन साम्राज्य दृढ करून वर्धमानही केले. दोन डोलकाठ्यांनी जहाजे - ही चित्रे असलेली त्याची नाणी कॉरोमांडेल किनाऱ्यावरील नगरीत सापडली आहेत. त्यावरून त्याची सत्ता समुद्रापर्यंतच नसून समुद्रावर आणि त्याच्याही पलीकडे पसरली होती हे आता सिद्ध झाले आहे. 
वासिष्ठिपुत्र सातकर्णीचे शिडाच्या जहाजाची मुद्रा असलेले नाणे

त्याच्या कारकीर्दीत पूर्व आणि पश्चिम माळवा, काठेवाड आणि राजपुतान्याचा प्रदेश पश्चिमीक्षत्रपांनी जिंकून घेऊन क्षत्रपराजा रुद्रदामन याने दक्षिणापथस्वामी पुळूमावी याचा दोनदा पराभव केला. तथापि रुद्रदामान आणि पुळूमावी याचे जवळचे नाते असल्यामुळे रुद्रदामनला समेट करावा लागला. रुद्रदामनची कन्या पुळूमाविची पत्नी होती. गौतमीपुत्र सातकर्णी नंतर काही काळासाठी सातवाहन व क्षत्रप राजांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते, त्याच काळात हा विवाह झाला असावा. क्षत्रप - सातवाहन विवाहाला राजकीय महत्वाबरोबरच संस्कृतिक महत्त्व देखील होते. रुद्रदामनची कन्या पुळूमाविची पट्टराणी होती. त्यामुळे सातवाहनांच्या चालिरीतीमध्ये, वेशभूषेमध्ये, केशभूषेमध्ये फार मोठा फरक झालेला दिसतो. पुळूमावी त्याच्या नाण्यांवर ग्रीक - रोमन राजपुत्रा सारखा दाखवलेला असून नाणेही ग्रीक - रोमन नाण्यांसारखे जोडभाषेत काढण्यात आले आहे. उत्तरेतील सत्ता गेली तरी पुळुवामीचे राज्य महाराष्ट्र, कोकण, वऱ्हाड, आंध्र ते दक्षिणेस पाँडिचेरी पर्यंत पसरले होते. नंतरचे क्षत्रपांचे हल्ले पुळूमाविने परतवून लावले. या सोबतच दक्षिणेतील कुंतलचा विस्तृत प्रदेश त्याने जिंकून घेतला आणि दक्षिण भारतावरील आपली सत्ता मजबूत केली. गौतमीपुत्र सातकर्णीच्या क्षत्रपांविरुद्धच्या अभियानामध्ये पुळूमाविने मोठी कामगिरी बजावल्याचे दिसते. प्रतिष्ठान ही त्याची आवडती राजधानी होती. क्षत्रपांनी आक्रमणात पैठणची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे दिसते. पैठण मध्ये क्षत्रपांची नाणी आणि ते ओतण्याचा साचा देखील मिळालेला आहे त्यावरून पैठण हे काही काळ क्षत्रपांनी जिंकून घेतले होते असे दिसते. नंतर पैठण जिंकून घेऊन पुळूमाविने नव्याने घडी बसविल्याचे दिसते.
वशिष्टीपुत्र पुळुमावी याचे शिल्प याचे नाणे

        क्षत्रपांच्या धर्तीवर स्वतःचा मुखवटा असलेली प्राकृत व द्राविडी भाषेतील नाणी त्याने प्रचारात आणली. पैठण येथे अशी नाणी मिळालेली आहेत. इथे सापडलेल्या नाण्याच्या दगडी साच्यात पुळूमाविचे भिन्न वयातील तीन मुखवटे कोरलेले आहेत ( तरुण, मध्यम, वृद्धत्व). गरूडा सारखे बाकदार नाक, किंचित पुढे आलेला खालचा ओठ आणि भारदस्त चेहेरा ही त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिषट्ये उठून दिसतात. त्यानेही रोमन राजपुत्रा प्रमाणे आपले केस मोकळे ठेवले असून भोवती रत्नांचा पुंजका असणारी रिबीन बांधलेली आहे. हा क्षत्रपांच्या संपर्काचा परिणाम असावा.

 नाशिकच्या लेण्यामधील वशिष्टीपुत्र पुळुमावी याचे शिल्प

पुळूमावी हा महाराष्ट्राच्या समृध्द कारकीर्दीचा शेवटचा राजा म्हणता येईल. पुळूमावी नंतर सातवाहन साम्राज्याचे विभाजन झाले असावे. महाराष्ट्रात स्कंद सातकर्णी तर आंध्र प्रदेशात वाशिष्ठीपुत्र सत्करणीने राज्य केले असावे असे त्यांच्या नाण्यांवरून दिसते.
गौतमी- बलश्री हिने पुत्रासंबंधी नाशिकला शिलालेख कोरविला तो याच्या राज्याच्या १९ व्या वर्षी होय. तिने त्यात 'महाराजपितामही' असे स्वतःचे वर्णन केले आहे. कारण पुलुमायी हा तिचा नातू त्या वेळी सम्राटपदी होता. पुलमायी ( २ रा ) याने इ. स. ९६ ते ११९ अशी २४ वर्षे राज्य केले. त्यानंतर वसिष्ठीपुत्र श्री सातकर्णी हा बहुधा त्याचा भाऊ किंवा नातू - गादीवर आला. हाही पराक्रमी होता. त्याने १२० ते १४९ अशी तीस वर्षे राज्य केले. त्यानंतर शिवश्री पुलमायी हा सम्राट झाला. याच्या कारकीर्दीत सातवाहन —शकसंघर्ष पुन्हा सुरू झाला. वसिष्ठीपुत्र पुलुमायीच्या कारकीर्दीत अखेरीस दुसऱ्या एका शकवंशाने उत्तरेत सत्ता स्थापिली होती. चष्टन या त्या वंशातील क्षत्रपाने कच्छमध्ये राज्य स्थापन केले व हळूहळू राज्यविस्तारास प्रारंभ केला होता. त्याचा महत्त्वाकांक्षी नातू रुद्रदामा हा आता सत्तारूढ झाला. त्याचा शिवश्री पुलुमायीशी संघर्ष सुरू झाला व दोनदा त्याने पुलुमायीचा पराभव केला. गिरनार येथे रुद्रदाम्याचा शिलालेख आहे. त्यात 'रुद्रदाम्याने दक्षिणापथपतीचा दोनदा पराभव केला, पण त्याचा नाश केला नाही; कारण तो त्याचा जवळचा नातलग होता' असे वर्णन आहे. शिवश्री हा रुद्रदाम्याचा जावई होता असे एकमत आहे. दुसऱ्या मतान्वये वसिष्ठीपुत्र सातकर्णी हा जावई असून शिवश्री हा नातू होता. म्हणजे जवळचा नातलग होता हे निश्चित.

 यज्ञश्री सातकर्णी :-

        पुळूमावी नंतर राज्यावर आलेल्या राजांत यज्ञश्री हा सर्वात बलशाली व प्रख्यात राजा होता. त्याने साधारण इ.स. १७१ ते १९९ पर्यंत राज्य केले. श्री यज्ञ सातकर्णी हा सातवाहन वंशातील शेवटचा मोठा सम्राट होय.हा सुद्धा स्वतःच्या नावापुढे गौतमीपुत्र असे बिरुद लावत असे. याची नाणी गुजराथ, काठेवाड, कोकण, चांदा, अकोला, गोदावरी, कृष्णा (आंध्रातील जिल्हे) या सर्व जिल्ह्यांतून विपुल प्रमाणात सापडली आहेत. त्यावरून रुद्रदाम्याचे आक्रमण परतवून याने पुन्हा सातवाहनसत्ता सर्वत्र प्रस्थापित केली असे दिसते. याच्या काही नाण्यांवर अश्वचिन्हही आहे. त्यावरून याने अश्वमेध केला असावा असे पंडित म्हणतात. कान्हेरी आणि नाशिक येथे मिळाल्या त्याच्या लेखावरून व नाण्यांच्या प्राप्तीस्थानावरून कळते की सातवाहनांची कोसळत चाललेली सत्ता त्याने टिकवली व दक्षिणापथावर आपली पकड मजबूत केल्याचे दिसते. गुजरात आणि सुराष्ट्राचा जो भाग रूद्रदामनाने जिंकला होता, तो पुन्हा याने जिंकून घेतला. सोबतच त्याने मध्यप्रदेश आणि गुजरात मधील क्षत्रपांचे उच्चाटन केले. मात्र ही स्थिती अल्पकाळच टिकली. पुळुवामी आणि यज्ञसातकर्णीने शिडाच्या जहाजांची मुद्रा असलेली नाणी पाडली होती यावरून त्यांचे समुद्रावरचे प्रभुत्त्व सिद्ध होते. त्याने आपली सत्ता पश्चिमसमुद्रापासून पूर्वसागरापासून प्रस्थापित केली. विदिशा व काठेवाडापर्यंतही त्याचा अंमल असावा असे काही तेथे सापडलेल्या यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवरून दिसते. 
यज्ञ सातकर्णीचे नाणे

पुराणातील माहिती प्रमाणे यज्ञश्रीने एकोणीस वर्षे राज्य केले मात्र, कृष्णा जिल्ह्यातील चिन या गावी सापडलेला लेख हा त्याच्या कारकिर्दीच्या सत्तविसव्या वर्षी कोरलेला आहे त्यावरून यज्ञश्रीने जवळपास तीस वर्षे राज्य केले. 

सातवाहन साम्राज्याची अखेर :-

  यज्ञश्री नंतर माढरीपुत्र शकसेन हा राजा झाला मात्र त्याचे नाव पुराणांमध्ये येत नाही. पुरणांनुसार नंतर विजय, चंडश्री, आणि पुलोम या राज्यांनी राज्य केले मात्र सातवाहनांच्या उतरतीला लागलेल्या राज्याला सावरण्याचे कर्तृत्व त्यांच्या कडे नव्हते.
यज्ञश्री नंतरच सातवाहन साम्राज्याची शकले पडण्यास सुरुवात झाली. आता हा वंश थकला होता. सतत सव्वाचारशे वर्षे एका कुळात कर्ते पुरुष निर्माण होणे ही गोष्ट फार दुर्मिळ असते. इतकी वर्षे एकसारखे थोर पराक्रमी सम्राट निर्माण झाले हेच जास्त होय. आता निसर्गक्रमाने उद्भवणाऱ्या विघटक शक्ती प्रबळ होऊ लागल्या.
     सातवाहनांची सामंत घराणी प्रबळ होत जाऊन त्यांनी पैठणची सातवाहनांची केंद्रिय सत्ता झुगारून दिली. व्यापारही बंद पडू लागल्याने सातवाहन साम्राज्य कमजोर होत गेले. उत्तरेत उषावदात (ऋषभदत्त) महाक्षत्रपाने शके १५१ (सन. २२९) मध्ये पश्चिम महाराष्ट्रात सातवाहनांचा पाडाव करून सत्ता बळकावली. ह्या ऋषभदत्ताने सुमारे २० वर्षे राज्य केले असावे. इस. २५० मध्ये पुन्हा एकदा राज्यक्रांती होऊन आभीरवंशीय ईश्वरसेनाने क्षत्रपांचा पराजय करून उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात आपले राज्य स्थापन केले.
 सातवाहनांच्या शाखोपशाखांतील भाऊबंदांनी वऱ्हाड, कुंतल येथे स्वतंत्र राज्ये स्थापिली. आभीर ही एक नवीच जमात या वेळी वर उसळली व तिने सातवाहन- साम्राज्याचे लचके तोडण्यास प्रारंभ केला. माळवा, गुजरात, काठेवाड हा प्रदेश अमीर व क्षत्रपांनी जिंकून घेतला. महाराष्ट्रात महाक्षत्रप ईश्वरदत्त याची सत्ता आल्याची दिसते. इ.स. २३० मध्ये सातवाहनांची सत्ता झुगारून देऊन त्याने स्वतःचे स्वातंत्र्य घोषित केले. यानंतर महाराष्ट्राचा आणि सातवाहनांचा संबंध संपला. नंतर काही काळासाठी आंध्रामध्ये सातवाहन कसेबसे टिकून राहिले. त्यांचा शेवटचा नृपती पुळूमावी याचा लेख बेल्लारी जिल्ह्यातील अडोणी येथे सापडलेला आहे. त्यात या परिसराला ' सातवाहननिहरा ' असे म्हणले आहे. म्हणजे मूळचे महाराष्ट्रातील सातवाहन आता आंध्राचे रहिवासी झाले. याच्या आधीच इस. २३० मध्ये विदर्भातही सातवाहनांची सत्ता संपुष्टात येऊन मुंडवशीयांनी आपले राज्य स्थापन केले 
आंध्रातील इक्ष्वाकू हे सातवाहनांचे सरदार होते, तेही आता स्वतंत्र झाले. अशी सर्व बाजूंनी पोखरणी लागल्यामुळे पुढील ३०/३५ वर्षे प्रतिष्ठानला सातवाहनसत्ता अस्तित्वात होती, तरी ती फार मर्यादित व निष्प्रभ अशी होती. इ. स. २२५ च्या सुमारास तीही नष्ट झाली व चारसाडेचार शतके अव्याहत चाललेल्या या पहिल्या महाराष्ट्र साम्राज्यसत्तेचा अंत झाला.
 गुजरात, काठेवाड, माळवा ह्या पश्चिमेकडच्या प्रदेशात मात्र पश्चिमी क्षत्रपांचा अंमल गुप्तांच्या राजवटीपर्यंत चालू राहिला. समुद्रगुप्ताने विदिशेपर्यंत गुप्त साम्राज्य स्थापन केले व त्याच्या पुढे चंद्रगुप्ताने वाकाटक नृपतीची मदत घेऊन तृतीय रूद्रसिंह क्षत्रप याचे राज्य अनुमाने सन ३९५ मध्ये संपूर्णतः खालसा केले व क्षत्रपांच्या भरुकच्छ (भडोच) या राजधानीवर कब्जा केला व अशा तर्‍हेने जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत आपल्या साम्राज्यात आणला व तत्पुर्वी खाली दक्षिणेत सातवाहनांची राजवट संपूर्ण नष्ट होऊन लहान लहान प्रांतिक राज्ये निर्माण होऊन दक्षिण भारताचा चेहरामोहरा बदलला.
     अशा तर्‍हेने एक वैभवशाली राज्य समाप्त झाले. सातवाहनांनी विस्तृत प्रदेशात केवळ दिर्घकाळ राज्य केले इतकेच नव्हे तर स्थापत्य, कला, साहित्य, संस्कृती, शिल्प, चित्रकला यातही संस्मरणीय अशी प्रगती केली. व्यापारास उत्तेजन देऊन जनतेस सुखी, समृद्ध केले आणि परकियांशी प्राणपणाने लढून आपले गमावलेले राज्य परत मिळविले व मातृभूमीस स्वतंत्र केले. याकाळात सातवाहनांची सतत क्षत्रपांबरोबर लहानमोठी युद्धे होत राहिली. प्रदेश मिळवावे लागले, गमवावे लागले. इ.स.पू. २३० ते इ.स. २३० ह्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी महाराष्ट्र देशी तसेच आंध्रातही सत्ता टिकवून धरली व महाराष्ट्राचे पहिले स्वतंत्र ज्ञात राज्यकर्ते झाले. ह्या सातवाहनांनीच सह्याद्रीत बांधलेल्या बहुतांश किल्ल्यांचा वापर गुप्तांनी,चालुक्यांनी, राष्ट्रकूटांनी, शिलाहारांनी व नंतर यादवांनी केला तसेच अधिक किल्ले बनवून भरही घातली. यादवसत्तेच्या पाडावानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी मात्र हे किल्ले, येथील प्रदेश आपल्या साम्राज्यात आणिला पण पुढे ह्याच सह्याद्रीच्या एका सातवाहननिर्मीत शिवनेरी नामक दुर्गावर छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला व पुढे ह्याच किल्ल्यांच्या सहाय्याने तसेच नवे किल्ले उभारून महाराष्ट्राला पुन्हा स्वराज्याचे दिवस दाखवले. असे सातवाहनांचे मोठे ऋण इये देशी आहे.

संदर्भ :-

१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) मुसलमानपूर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - वा. कृ. भावे
४ ) मिराशी, वा. वि., जर्नल ऑफ न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया, खंड : ३४, वाराणसी.
५ ) पाठक, ए. एस. संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड १), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
६ ) 'सह्याद्री' - श्री. सदाशिव जोगळेकर
७ ) www.coinindia.com  
८ ) Shastri, Ajay Mitra, The Satavahanas and The Western Kshatrapas : A Historical Framework, Nagpur, 1998.
९ ) महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर : इतिहास प्राचीन काळ , खंड १, मुंबई, २००३.
१० ) मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.
११ ) पुराभिलेख विद्या - शोभना गोखले
१२ ) वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ - वा. वी. मिराशी 
१३ ) http://www.misalpav.com/
१४ ) http://en.wikipedia.org
१५ ) https://mr.wikisource.org/
१६ ) https://goanvarta.net/story.php?id=56400 
१७ ) https://www.maayboli.com/node/65524
१८ ) https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/
१९ ) http://www.preservearticles.com/2011092013668/short-notes-on-gautamiputr...
२० ) ashwinchitale.home.blog
२१ ) marathivishwakosh.org
२२ ) Sarma, I. K., Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
२३ ) Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
२४ ) Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade-Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
२५ ) maharashtratimes.com
२६ ) lokmat.com
२७ ) Bhandare, Shailendra & Garg, Sanjay, Eds., ‘Linking the Past : Overstruck Coins and Chronology of the Satavahanasʼ, Felicitas : Essay in Numismatics, Epigraphy and History in Honour of Joe Cribb, 2011.
२८ ) https://www.lokmat.com/chhatrapati-sambhajinagar/satavahan-days-stone-flour-mill-aurangabad-same-time-two-women-were-needed-grinding/
२९ )  https://goanvarta.net/story.php?id=56400 
३० ) www.indianetzone.com
३१ ) www.vcoins.com
३२ ) discovermh.com
३३ ) https://sanjaysonawani.blogspot.com/2015/11/blog-post_23.html
३४ ) https://www.mahamtb.com/Encyc/2018/2/4/Article-on-Satwahana-Empire-By-Rashmi-Marchande-.html#/google_vignette
३५ ) https://anandghare.wordpress.com/
३६ ) https://www.bbc.com/marathi/india-43441606
३७ ) www-britannica-com.translate.goog
३८ ) https://marathispandan.com/
३९ ) http://vithal-khot.blogspot.com/2011/12/blog-post_5956.html
४० ) https://vajiramandravi.com/upsc-exam/satavahana-era/
४१ ) uppsctarget.com
४२ ) https://hamargoth.com/satavahana-dynasty-in-chhattisgarh-an-era-of-glory-and-prosperity/
४३ ) https://www.careertutorial.in/study-material/bharat-ka-itihas/prachin-bharat/satvahan-rajvansh-60-240ce/
४४ ) https://historyguruji.com/satavahana-dynasty-and-gautamiputra-satakarni-in-hindi/
४५ ) https://historiesindia.blogspot.com/2010/07/satavahana-empire200-bc-ad-250.html


वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात)  स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय प्राप्त झाला. तत्कालीन ट्रेजर ट्रॉव्ह ॲक्ट अंतर्गत त्या काळातील प्रांतिक सरकारने सदर निधी ताब्यात घेतला व मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर यांच्याकडे पाठविला.

विदर्भामध्ये सापडलेला सातवाहनकालीन नाण्यांचा हा दुसरा महत्त्वाचा नाणेसंचय आहे.  यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सापडलेला चांदा नाणेनिधी म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेसंचय आढळून आला. तऱ्हाळे नाणेसंचयाचे संशोधन व प्रकाशन सर्वप्रथम वा. वि. मिराशी यांनी केले.

नाणेसंचयाचे वर्णन : नाणेसंचयातील १६०० नाण्यांपैकी १५२५ नाणी पूर्ण आकाराची तर, ७५ नाण्यांचे तुकडे आढळून आले. सर्व नाणी केवळ सातवाहन नृपतींची होती. परदेशी राजवंशाचे (उदा., रोमन) एकही नाणे नव्हते, हे या नाणेसंचयाचे वैशिष्ट्य. प्राप्त नाणी पोटीन या मिश्र धातूची (तांबे व शिसे या धातूंचे मिश्रण) होती.  तथापि निरनिराळ्या नाण्यांमध्ये तांबे व शिसे यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे आढळून आले. काही नाणी शिसे या धातुप्रमाणे काळी तर काही तांब्याप्रमाणे तांबड्या चकचकीत रंगाची असल्याचे दिसून आले.

नाण्यांचे वर्णन : संचयातील सर्व नाणी एकाच प्रकारची व गोलाकार आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेला हत्ती व गोलाकार कडेवर व ब्राह्मी लिपीत व  प्राकृत भाषेत राजाचे नाव सांगणारा लेख तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. उज्जैन चिन्हाच्या चार बाजूंवरील मोठ्या वर्तुळांमध्ये एक लहान वर्तुळ (वर्तुळात वर्तुळ) आहे. काही वर्तुळांच्या वरच्या बाजूला चंद्रकोर आहे.

कर्ण सातकर्णी या राजाची नाणी वगळता उर्वरित नाण्यांवर दर्शनी भागावरील हत्तीचे तोंड उजवीकडे आहे. कर्ण सातकर्णीच्या नाण्यांवर मात्र हत्तीचे तोंड डावीकडे आहे, असे निरीक्षण मिराशींनी नोंदविले आहे. काही नाण्यांची चकती (planchet) लेखाच्या ठशापेक्षा लहान असल्यामुळे बऱ्याच नाण्यांवर लेख अपूर्णावस्थेत आहेत. नाणी वजनाने हलकी असून वजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. प्राप्त नाण्यांचे नृपतीनिहाय वर्णन पुढीलप्रमाणे :

गौतमीपुत्र सातकर्णी : नाण्यांची संख्या –  ५७३. निधीतील सर्वाधिक नाणी या नृपतीची आढळतात. नाण्यांवर सिरि सातकणिस  किंवा  सिरि  सातकणि  हे लेख आढळतात. नाण्यांचे वजन – ३१- ६० ग्रेन्स दरम्यान.

वाशिष्ठिपुत्र पुळुमावी : नाण्यांची संख्या – १७४. नाण्यांवर रञो सिरि पुळुमाविस  अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ४५  ग्रेन्स दरम्यान.

चौथा सातकर्णी : नाण्यांची संख्या – ३५. नाण्यांवर सिव सिरी सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : २६ – ३८ ग्रेन्स दरम्यान.

शिवश्री पुळुमावी : नाण्यांची संख्या – ३२. नाण्यांवररञो सिव सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३७ – ५० ग्रेन्स दरम्यान.

स्कंद सातकर्णी :  नाण्यांची संख्या – २३. नाण्यांवर (रञो) सिरि खद सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ५० – ५२ ग्रेन्स दरम्यान.

यज्ञ सातकर्णी : नाण्यांची संख्या २४८. नाण्यांवर रञो सिरि यञ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३१ – ४५ ग्रेन्स दरम्यान.

विजय सातकर्णी : नाण्यांची संख्या : ४. नाण्यांवर (सिरि) विजय सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ५० ग्रेन्स दरम्यान.

कुंभ सातकर्णी : नाण्यांची संख्या : ५६. नाण्यांवर  (रञो) सिरि कुभ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : सरासरी ३० ग्रेन्स.

कर्ण सातकर्णी : नाण्यांची संख्या – ७. नाण्यांवर  सिरि कण सातकणिस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ३० – ३६ ग्रेन्स दरम्यान.

शक सातकर्णी : नाण्यांची संख्या –  ४. नाण्यांवर सिरि सक किंवा सकस सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ३४ – ३७ ग्रेन्स दरम्यान.

श्री पुळुहामवी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर (रञो सिरि) पुळुहामविस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ४० – ५१ ग्रेन्स दरम्यान.

याशिवाय ज्या नाण्यांवरचे लेख वाचता येत नाहीत, अशा नाण्यांची संख्या ३६५ एवढी आहे.

नाणेसंचयाचे महत्त्व :  चांदा नाणेनिधी प्रमाणेच नंतरच्या काळात सापडलेला  तऱ्हाळे नाणेसंचय सातवाहनांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा स्रोत ठरतो. आतापर्यंत सापडलेल्या सातवाहनकालीन नाणेसंचयामध्ये हा नाणेसंचय मोठा आहे. उत्तर सातवाहन काळातील सातवाहन नृपती व त्यांचा कालक्रम ठरविण्यासाठी या नाणेसंचयाची मदत होते. हत्ती व उज्जैन छापाची नाणी विदर्भात चलनात होती, हे या संचयामुळे सिद्ध होते. पुराणात वर्णन केलेल्या अनेक सातवाहन राजांची नाणी प्रथमच या नाणेसंचयाद्वारे प्राप्त झाली.  तसेच पुराणात उल्लेख नसलेल्या काही राजांची नाणीदेखील या संचयामुळे प्रकाशात आली. सातवाहन राजवंशाच्या अगदी शेवटच्या काळात सातवाहनांची सत्ता विदर्भापुरती मर्यादित असल्याचे पुरावे या नाणेनिधीमुळे प्राप्त झाले.

संकेतशब्द : तऱ्हाळे, वाशिम, अकोला, सातवाहन, वा. वि. मिराशी, चांदा,  गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठिपुत्र पुळुमावी,  सातकर्णी चौथा, शिवश्री पुळुमावी,  स्कंद सातकर्णी,  यज्ञ सातकर्णी, विजय सातकर्णी, कुंभ सातकर्णी,  कर्ण सातकर्णी, शक सातकर्णी,  पुळुहामवी, विदर्भ

संदर्भ :

  • Mirashi, V. V. ‘Studies in Indology’, Vol. 3, (Ancient Indian Coins), Vidarbha Samshodhan Mandal, pp.34-48, Nagpur, 1962.
  • Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
  • Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
  • Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade – Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
  • पाठक, अरुणचंद्र संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड :१), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
https://marathivishwakosh.org/35542/

​महाराष्ट्रातील सातवाहनकालीन नाण्यांचा एक प्रसिद्ध संचय. ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला (ऑक्टोबर १८८८). ब्रिटिश पोलीस उपअधीक्षक जे. हिगीन्स यांनी सापडलेला हा संचय एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेकडे सुपुर्द केला. या नाणेसंचयाचा अहवाल प्रथम डॉ. हॉर्नले यांनी प्रोसिडिंग्ज ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमध्ये प्रसिद्ध केला (१८९३). या नाणेसंचामध्ये एकूण १८३ नाण्यांचा समावेश होता. संचयातील सर्व नाणी सातवाहन नृपतींची होती.  या संचयाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भात सापडलेला सातवाहन नाण्यांचा हा प्रथम संचय होय.

नाण्यांचे वर्णन : या निधीतील सर्व नाणी पोटीनची (तांबे व शिसे यांचा मिश्र धातू) आहेत. दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती, तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह या प्रकारची ही नाणी आहेत. यांच्या  दर्शनी भागावर गोलाकार कडेवर राजाचे नाव असणारा प्राकृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ही नाणी साधारणपणे ३०-५० ग्रेन्स वजनाची आहेत.

एकूण १८३ नाण्यांपैकी हॉर्नले यांनी ५१ नाणी गौतमीपुत्र सातकर्णी, २४ नाणी वासिष्ठीपुत्र पुळुमावी, तर ४२ नाणी यज्ञ सातकर्णी यांची असल्याचे दर्शविले आहे. हॉर्नले यांच्या नोंदींप्रमाणे गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यांवर सिरि सातकरणि  (सदर वाचन प्राकृत भाषेच्या नियमाना धरून नाही, हे आधुनिक काळातील सातवाहन नाण्यांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.) अथवा सिरि सातकणिस हे लेख आढळले. वासिष्ठिपुत्र पुळुमावीच्या नाण्यांवर (सि) अथवा सिरि पुळुमाविस अशा प्रकारचे लेख आढळले. पुळुमावीच्या काही नाण्यांवर सिरि (श्री) हा बहुमानदर्शक शब्द न आढळता केवळ पुळुमाविस असाही लेख आढळला आहे (ही नाणी त्रुटित लेखांची असल्याने त्यावर फक्त पुळूमावीस एवढाच लेख दिसतो). यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवर *ञ सीरि यञ सातकणि  (* = पहिले अक्षर वाचता येत नाही) असा लेख दिसून येतो. याशिवाय काही नाण्यांवर अनिश्चित स्वरूपाचे लेख आढळले. यांपैकी एका नाण्यावर (गद?) सात, दोन नाण्यांवर सिरि (किंवा रि )कणु सात (ही नाणी बहुदा कर्ण सातकर्णीची असावीत, असे नंतर सापडलेल्या  पुराव्यांवरून विशेषतः तऱ्हाळे नाणे संचयात प्राप्त झालेल्या नाण्यांवरून  वाटते.) आणि उर्वरित दोन नाण्यांवर फक्तरञो  (किंवा ञ्ओ) अशा प्रकारचे लेख आहेत. हॉर्नले यांना या नाण्यांची ओळख पटवता आलेली नाही.​ मुळात चांदा नाणेसंचय हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात सापडला असून त्या काळी सातवाहन नाण्यांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धी झाली नव्हती, तसेच सातवाहन नाण्यांबद्दलची माहिती अपूर्ण होती. या मर्यादा लक्षात घेऊन चांदा नाणेसंचयाचा अभ्यास करावा लागेल. वरील नाणेनिधीतील काही नाणी ब्रिटिश म्युझिअम, लं​​डन, काही नाणी इंडियन म्युझिअम, कोलकाता येथे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय ६० नाणी किंवा नाण्यांचे तुकडे सापडले आहेत. त्यांच्या दर्शनी भागावरील हत्तीचे चिन्ह व मागील बाजूवरील उज्जैन चिन्ह स्पष्ट दिसत असले, तरी लेख संपूर्णपणे नष्ट झाले आहेत.

नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी हा वर सांगितल्याप्रमाणे विदर्भात सापडलेला पहिला नाणेसंचय आहे. यानंतर इतर नाणेसंचय सापडले असले, तरी सातवाहनकालीन नाण्यांचा तपशीलवार अभ्यास करणे या नाणेनिधीमुळे शक्य झाले. सातवाहनकालीन विशेषतः उत्तर सातवाहकालीन नाण्यांचा संचय यादृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे. सातवाहनांच्या नाण्यांची व्याप्ती व प्रसार खूप विस्तृत आहे. सातवाहन नृपतींनी   त्यांच्या आधिपत्याखालील विविध प्रदेशांमध्ये  वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली. त्यामुळे सातवाहनकालीन नाण्यांचा अभ्यास करताना तो कालक्रमानुसार तसेच प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार करणे सयुक्तिक ठरते. त्यांपैकी विदर्भात उत्तर सातवाहन काळात हत्ती व उज्जैन चिन्ह असलेली नाणी दीर्घकाळ प्रचलित असल्याचे कळते. सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे राज्य फक्त महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा भागापुरते मर्यादित असल्याचे चांदा व तऱ्हाळे नाणेसंचयावरून दिसून येते. सातवाहनांच्या हत्ती व उज्जैन छापाची नाणी तांबे, शिसे व पोटीन या धातूंमध्ये आढळतात. त्यांपैकी चांदा येथे केवळ पोटीनची नाणी आढळली आहेत. मूलतः या नाण्यांची व्याप्ती मोठी असली, तरी सातवाहनांच्या शेवटच्या काळात ती केवळ विदर्भात आढळतात. त्यामुळे उत्तर सातवाहनकालीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने चांदा नाणेसंचय महत्त्वाचा ठरतो.

संदर्भ :

  • Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980
  • Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
  • Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade- Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.

                                                                                                                                                                                                                          समीक्षक : पद्माकर प्रभुणे


https://marathivishwakosh.org/37077/

जोगळटेंभी  नाणेसंचय :  जोगळटेंभी (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील प्रसिद्ध नाणी. १९०८ मध्ये पश्चिमी क्षत्रप राजवंशातील क्षहरात घराण्यातील नहपान राजाच्या चांदीच्या नाण्यांचा मोठा संचय येथे सापडला. या संचातील १३,२५० एवढ्या नाण्यांची अधिकृत नोंद आढळत असली, तरी प्रत्यक्षात या नाण्यांची संख्या १४,००० ते १५,००० असावी, असे नोंदवले आहे. हा नाणेसंचय प्रथम रेव्ह. एच. आर. स्कॉट यांनी प्रसिद्ध केला (१९०८).

जोगळटेंभी येथील नहपानाचे नाणे.

नाणेसंचयाचे स्वरूप : या संचयात सापडलेल्या १३,२५० नाण्यांपैकी ९,२७० नाणी ही नहपानाचा समकालीन सातवाहन कुळातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने आपल्या स्वतःच्या  चिन्हांनी पुनर्मुद्रांकित (counter-struck) केलेली होती. गौतमीपुत्र  सातकर्णी  हा नहपानाचा  शत्रू होता. त्याचा नहपानाबरोबर दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. या संघर्षाचे पर्यवसान गौतमीपुत्राने नहपानाचा व पर्यायाने त्याच्या क्षहरात वंशाचा  उच्छेद करण्यात झाले, असे उल्लेख  तत्कालीन अभिलेखीय व साहित्यिक नोंदींमध्ये आढळतात. उर्वरित जवळपास ४,००० नाण्यांवर मात्र अशा प्रकारचे गौतमीपुत्र सातकर्णीचे अंकन आढळत नाही. प्राप्त साठ्यापैकी एकूण २,००० नाण्यांना भोके पाडली आहेत.

नाण्यांचे वर्णन : प्राप्त सर्व नाणी चांदीची असून १.८० ते २.१० ग्रॅ. वजनाची आहेत. फक्त नहपानाचे अंकन असलेल्या नाण्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे : नाण्यांच्या दर्शनी भागावर राजाची टोपी घातलेली अर्धप्रतिमा आहे. राजाच्या प्रतिमांमध्ये वैविध्य आढळत असून राजाच्या तारुण्यापासून ते वृद्धत्वापर्यंत वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरील प्रतिमा नाण्यांवर आढळतात. प्रतिमांचे अंकन वास्तवदर्शी व कौशल्यपूर्ण आहे. दर्शनी भागावरील गोलाकार कडेवर ग्रीको-रोमन लिपीतील लेख आहे. हा लेख म्हणजे नाण्याच्या मागील बाजूवरील ब्राह्मी व खरोष्ठी लिपीतील लेखांचे लिप्यंतर आहे. बऱ्याच नाण्यांवरील ग्रीको-रोमन लिपीतील लेख अशुद्ध रूपातील आहे. नाण्यांच्या मागील बाजूस नहपानाचा पूर्वज असलेल्या भूमकाच्या नाण्यांवर दर्शनी बाजूवर आढळणारी वज्र व बाण ही चिन्हे आहेत. वज्र व बाणाच्या मध्ये टिंब आहे. मागील बाजूच्या  गोलाकार कडेवर ब्राह्मी लिपीतील ‘राज्ञो क्षहरातस नहपानसʼ हा व खरोष्ठी लिपीतील ‘राञो छहरतस नहपनसʼ असे लेख आहेत. नाण्यांवर वर्षाचा उल्लेख आढळत नाही.

गौतमीपुत्र सातकर्णीने  पुन्हा अंकन केलेल्या नाण्यांचे वर्णन : नहपानाच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने आपले छाप मारलेले आढळतात. यामध्ये सामान्यतः दर्शनी बाजूवर चैत्य व गोलाकार कडेवर ‘राञो गोतमीपुतस सिरि सातकनिसʼ हा ब्राह्मी लिपीतील लेख आढळतो. तर मागील बाजूस उज्जैन चिन्ह आहे.  तथापि काही वेळा पुढील व मागील बाजूंवरील चिन्हांची अदलाबदल झालेली दिसून येते. गौतमीपुत्राने केलेले अंकन ठसठशीत स्वरूपाचे असल्यामुळे त्यावरील चिन्हांची वैशिष्ट्ये ओळखणे शक्य होते. चैत्य व उज्जैन चिन्हांमध्ये आढळणारी वैविध्ये बघता वेगवेगळे छाप वापरल्याचे लक्षात येते. तसेच काही नाण्यांवरील लेख सुस्पष्ट व नीटनेटके असून काहींवरील अक्षरे मोठी, वेडीवाकडी व अस्पष्ट असल्याचे दिसून येते. वर्षाचा उल्लेख आढळत नाही.

नाणेसंचयाचे महत्त्व : नहपानाच्या काही फुटकळ नाण्यांच्या प्राप्तीनंतर प्रथमच एवढा मोठा नाणेसमुच्चय नाणेसंशोधकांना अभ्यासासाठी प्राप्त झाला. या उपलब्धीमुळे तत्कालीन नाणेपद्धतीवर तर प्रकाश पडतोच; पण त्याचबरोबर पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजवंशाच्या राजकीय इतिहासावरही प्रकाश पडतो. पश्चिमी क्षत्रप व सातवाहन राजांच्या परस्परसंबंधाचे विश्लेषण याद्वारे करणे शक्य होते. विशेषतः गोदावरी खोऱ्यातील या दोन राजवंशांचा संघर्ष अधोरेखित होतो.  याबरोबरच तत्कालीन सांस्कृतिक व आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठीही या नाणेसंचयाची मदत होते. या नाण्यांवरून नहपानाच्या राज्याची भौगोलिक सीमा ठरवता येते. त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकर्णीने नहपानाचा उच्छेद केल्यानंतरही त्याची नाणी पुन्हा अंकन करून चलनात आणल्याचे कळते. थोडक्यात तत्कालीन इतिहासाचे साधन म्हणून या नाणेसंचयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

संदर्भ :

  • Jha, Amiteshwar & Rajgor, Dilip, Studies in the Coinage of the Western Kshatrapas, Indian Institute of Research in Numismatic Studies, Anjaneri, 1992.
  • Scott, H. R. ‘The Nasik (Jogaltembhi) Hoard of Nahapan’s Coinsʼ, The Journal of the Bombay Branch of the Royal Asiatic Society, Vol. XII, pp. 223- 244, Bombay, 1908, Reprint-1969.
  • Shastri, A. M. The Satvahanas and The Western Kshatrapas, Nagpur, 1998.
  • पाठक, अ. शं. संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड १), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.

                                                                                                                                                                                                           समीक्षक : अरुणचंद्र पाठक ; मंजिरी भालेराव

https://marathivishwakosh.org/29404/




 
 
 
 
 
 






      



















 

 



















हिंदू नववर्षाची सुरूवात शक संवत्सर या प्राचीन भारतीय दिनदर्शिकेनुसार होते. हाच दिवस महाराष्ट्रात ‘गुढीपाडवा’ तर कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ‘युगादी’ म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे सिंधी उत्सव ‘चेटी चंड’ हा देखील याच दिवशी साजरा करण्यात येतो. भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय आहे. प्रांतागणिक येथे विविधता आढळते. ही विविधता सण, उत्सव यांच्या माध्यमातून व्यक्त होणारी आहे. भारतीय परंपरांना सांस्कृतिक महत्त्वासह ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हेच ऐतिहासिक महत्व गुढीपाडवा या सणालाही आहे. आज मोठ्या प्रमाणात ग्रेगोरियन दिनदर्शिका प्रचलित असली तरी भारतीय मातीत निर्माण झालेल्या शक व विक्रम या दोन दिनदर्शिकांचे भारतीय समाजातील महत्त्व अबाधित आहे.Indian National Calendar And Shak Samvat | Mytho World

पुराणानुसार, गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. हिंदूकालगणनेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत या दोन संवताला महत्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनात आपण इंग्रजी तारीख वापरतो, पण सण समारंभ हिंदू तिथी नुसारच साजरे  होत असतात, त्यात सुद्धा आपण शालिवाहन शकाचा काळगणने साठी जास्त वापर करतो. दरम्यान, शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाल्याचं म्हटलं जातं. दक्षिण भारतात ही कालगणना आजही वापरात आहे. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी जाणून घेऊया गुढीपाडवा : शालिवाहन शक काय आहे? ते कोणी आणि कधीपासून सुरू केलं? - BBC News  मराठी

मुळात भारतीय कालगणनेच्या क्षेत्रात “शक’ या शब्दास अनन्यसाधारण महत्त्व आहे. युधिष्ठिर शक, शालिवाहन शक, विक्रम शक, शिव शक इ. शब्दांमधील “शक’ हा शब्द परकीय भाषांमधील “सन’, “साल’ या अर्थाने म्हणजे कालगणनेचा वाचक मानला जातो. शालिवाहन शक येशू खिस्ताच्या जन्मानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी सुरू झाला. तो महाराष्ट्रच नव्हे, तर दक्षिण क्षेत्र आणि उत्तरेकडीलही काही राज्यांत चालला. धर्मकृत्यांत अजूनही चालतो. या वेळी महाराष्ट्रात सातवाहन वंशाचे राज्य होते. शालिवाहन हा शब्द “सातवाहना’चा पर्याय म्हणूनही वापरला जातो. त्यावरून ही कालगणना सातवाहन वंशातील राजाने सुरू केली. “ज्याच्या योगाने काल गणणे शक्‍य होते तो शक’. “शक’ हा शब्द “शक्‍नोति’पासून निष्पन्न झाला. Gautamiputra Satakarni Movie Announcement Photos

प्रतिवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रात आपण “पाडवा’ असे म्हणतो. त्याची गणना साडेतीन मुहूर्तांमध्ये होते. दिवाळीच्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या आणखी एका म्हणजे विक्रम शकाच्या वर्षारंभाच्या दिवसापेक्षा, म्हणजेच पाडव्यापेक्षा त्याचे वेगळेपण सांगण्यासाठी त्याला “गुढी पाडवा’ असे म्हटले जाते. त्या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करून नव्या उमेदीने जगण्यास आपण सज्ज होतो. दक्षिणेकडे या दिवसाला “युगादी’ असे म्हणतात.

पण हे शककर्ते राजे कोण होते? या कालगणनेविषयी आणि शककर्त्यांविषयी गेल्या काही वर्षांत आणखी एक मतप्रवाह पुढे आला आहे. शालिवाहन राजाने ही कालगणना सुरू केली नसून शकांनीच सुरू केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.





चष्टन राजाने सुरू केला शक?

पुण्यातील इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली पलांडे दातार यांनी मात्र यापेक्षा वेगळी माहिती दिली. त्यांनी म्हटलं होतं की, "सातवाहन राजाने शकांना हरवलं आणि तेव्हापासून शक संवत्सर (कालगणना) सुरू झालं हा गैरसमज आहे. शक हे इराणधून - तिथल्या सिथिया प्रांतातून आले होते. त्यांनी तत्कालीन भारतीय संस्कृती आत्मसात केली. धर्म स्वीकारले. त्यांच्या घराण्याच्या क्षहरात आणि कार्दमक अशा दोन शाखा होत्या. शहरांपैकी नहपान याचं गुजरात आणि राजस्थानमध्ये राज्य होतं. हा राजा नाशिक इथंही राज्य करत होता. त्याच्या संदर्भातील शिलालेख पांडव लेण्यात सापडतात. नाशिकजवळ गोवर्धन इथं गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाने नहपानाचा पराभव केला आणि क्षहरातांचा निर्वंश केला. त्यानंतर सातवाहन राजांनी नाशिक जवळील नहपानाचं राज्य आपल्या अखत्यारीत घेतलं." असे इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली पलांडे दातार म्हणतात. Vitthal Khot Blogs: शालिवाहन शक सातवाहन राजांशी संबंधित आहे

"गुजरातधील कार्दमक शाखेचा पहिला राजा चष्टन गादीवर आला. इसवी सन ७८मध्ये चष्टनने स्वतःचे राज्य सुरू करून राज्याभिषेक शक सुरू केला. त्याने काढलेल्या नाण्यांवर शकाचा पहिला उल्लेख आढळतो. तो त्याच्या वंशातल्या राजांनी ३०० वर्षं वापरला. पुढे वाकाटक राजा देवसेन आणि चालुक्य सम्राट पुलकेशी यांच्या लेखातही आपल्याला शकाचा (शालिवाहन शक नव्हे) उल्लेख आढळतो. नंतरच्या काळात शालिवाहन हे त्याला जोडलं गेलं आहे."

 जुन्नरच्या लेण्यांध्येही शिलालेख

"जुन्नर आणि परिसरातल्या लेण्यांमध्ये या काळाशी संबधित शिलालेख मिळाले आहेत. रोमच्या व्यापारावर आपलं वर्चस्व असावं यासाठी त्याकाळी लढाया व्हायच्या. गौतमीपुत्राने नहपानावर वर्चस्व मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक नाण्यावर आपले शिक्के मारले", असं सायली पलांडे दातार म्हणाल्या. जर्मनीचे डॉ. हॅरी फाल्क हे इंडॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनातून ही नवीन माहिती समोर आल्याचं सायली यांनी सांगितलं होतं.satvahan dynasty inmarathi – InMarathi

शालिवाहन शके आणि मराठी नववर्ष

सातवाहनकालीन दरबारी पंडित गुणाढ्य यांनी ‘बृहत्कथा’ लिहिली. पैठण हे गोदावरीच्या किनाऱ्याने पाच मैलापर्यंत पसरलेलं होतं, असं त्यानं म्हटलं आहे. भव्य प्रासाद, धार्मिक वास्तू, उद्यानं याचा उल्लेख त्यात आहे. प्राकृत भाषेचा उदय याच काळात झाला. यातूनच पुढे आधुनिक मराठीचा जन्म झाला असं मानतात.

 प्रभाकर देव यांनी ग्रीक भाषेत सापडलेल्या एका अनामिक ग्रीक प्रवाशाच्या प्रवासवर्णनातील संदर्भ दिले.त्यांनी म्हटले होते की, "पेरीप्लस ऑफ द युरेथ्रियन सी या प्रवासवर्णात सातवाहनाचा संपन्न कालखंड दिला आहे. हा प्रवासी इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने मराठवाड्यातील अप्रतिम शहरांचे वर्णन केले आहे."

 "पैठणचा उल्लेख तो ‘पैतान’ असे करतो. पैठणहून तो भोगवर्धन (भोकरदन, जालना) इथे गेला. तिथून तगरपूरला (तेर, उस्मानाबाद) गेला. ही २००० वर्षांपूर्वीची भारतातली मोठी शहरे होती. त्या काळातील नऊ महानगरांपैकी तीन आजच्या मराठवाड्यात होती. या शहरांतून मोठ्या प्रमाणावर व्यापार व्हायचा. निर्यात केली जायची," देव सांगतात.

 ४५० वर्षांचा सुवर्ण कालखंडाची आठवण

 शालिवाहन शक कालगणनेच्या रूपानं एका सुवर्ण कालखंडाची आठवण आपण ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा देव यांनी व्यक्त केलेली. त्यांनी म्हटलं होतं, या साडेचारशे वर्षांच्या काळात जे व्यापारीमार्ग तयार झाले त्या मार्गांवर लेणी कोरली गेली. १२००  पैकी ९०० लेणी याच मार्गांवर आढळतात. पश्चिम किनारपट्टीवर व्यापारी बंदरे होती. तिथे मोठी शहरे उदयास आली. याच काळात इंडो-रोमन व्यापार भरभराटीस आला. दुर्दैवाने आपला इतिहास उत्तर भारतावर केंद्रित आहे. गुप्त साम्राज्यापेक्षाही शालिवाहनांचे  साम्राज्य मोठे होते. कार्ले, भाजे, नाशिक, जुन्नर, पितळखोरा, वेरुळच्या लेण्यांमध्ये सातवाहन राजांचा उल्लेख आढळतो.







चष्टनाने सुरू केले शालिवाहन शक - डॉ. मंजिरी भालेराव

शालिवाहनाने सुरु केलेल्या कालगणनेला शालिवाहन शक म्हणतात असं आत्तापर्यंत समजलं जात होतं, पण संशोधनातून वेगळीच माहिती पुढे आली आहे.

 चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला गुढीपाडवा हे नाव आहे. या दिवशी हिंदूूंच्या नवीन वर्षांची सुरुवात होते म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असेही नाव आहे. भारतीय परंपरेमध्ये अतिशय मोठय़ा प्रमाणात वापरला गेलेला आणि शालिवाहन शक नावाने प्रसिद्ध असलेला संवत्सर या दिवशी सुरू होतो. या संवत्सराची स्थापना शालिवाहन म्हणजे सातवाहन या राजाने शक राजांचा पराभव करून केली असे सर्व भारतीय मानतात. ही घटना साजरी करण्यासाठी आपापल्या घरांवर गुढय़ा उभारल्या जातात. कलियुगाची ३,१७९ वर्षे संपल्यानंतर या संवत्सराची सुरूवात होते असेही भारतीय परंपरेत मानले आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाने या दिवशीच सृष्टीची निर्मिती केली असाही समज लोकांमध्ये रूढ आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते. फार प्राचीन काळापासून गुढीपाडवा आणि शालिवाहन शकाची सुरुवात या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडला गेला आहे. 



- लोकप्रभा (कव्हर स्टोरी, ४२ वर्धापनदिन विशेष)






आता शक संवत्सर, गुढी, आणि नववर्ष यांचा संबंध कसा आला असावा याविषयी:

मुळात वैदिक विचारांनुसार चैत्र हा पहिला महिना नाहीच..मार्गशीर्ष हा आहे. मग चैत्र हा महिना पहिला कसा झाला असावा?

दिनांक २० मार्च २०१७ ला म्हणजेच एक आठवड्यापूर्वी “विषुवदिन” साजरा झाला म्हणजेच या दिवशी सूर्य बरोबर विषुववृत्ताला ९० अंशामध्ये होता आणि तेव्हापासून आपल्याकडचा प्रसिद्ध वसंत ऋतू सुरु होतो आणि हा ऋतू नेहमीच सर्व ऋतुंमध्ये पहिला येतो (ऋतुगणनेची सुरुवात वसंत ऋतू पासून होते) अगदी कालिदासाच्या ऋतुसंहार मध्ये सुद्धा! भगवद्गीतेमध्ये स्वतः कृष्ण म्हणतो “मासानां मार्गाशिर्षोsहमृतुनां कुसुमाकरः” – सर्व महिन्यांत मार्गशीर्ष (श्रेष्ठ) मी आहे..आणि सर्व ऋतूंत वसंत (श्रेष्ठ ऋतू) मी आहे!

मला असं वाटतं, की या वसंत ऋतूचा आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या “Creation” किंवा “नवनिर्मिती” या ideasचं Contribution हे चैत्र महिना पहीला होण्यामागे असावं. असो. यावर माझं अजून काम सुरु आहे..

आता गुढीबद्दल:
ज्याप्रमाणे कुठल्याही धार्मिक विधीला Practical जगामध्ये शून्य अर्थ असतो तसंच या गुढीचं सुद्धा आहे..

या गुढीची पूजा एकेकाळी इंद्रध्वज म्हणून करत असावेत, हे आपण वर पाहिलं, किंवा याला स्वागत करण्यासाठी आजकालच्या फ्लेक्स, पोस्टर्स सारखं याचं स्वरूप असावं असाही एक निष्कर्ष अयोध्येच्या उभारलेल्या “Welcome गुढयांवरून” निघू शकेल.

मला असं वाटतं गुढीपाडवा हा “हिंदूंचा” एकमेव असा सण असेल जो इतक्या उत्साहाने समाजातील सर्व घटक साजरे करतात, ज्यामध्ये विधीसाठी लागणाऱ्या बऱ्यापैकी वस्तू लागतात (हार, वस्त्र, गढू वगरे) आणि तरीदेखील ज्याला भटजी, गुरुजी, ब्राह्मण, पुरोहीत यांची गरज नाही!

हां आता दिवाळीतले भाऊबीज, लक्ष्मीपुजन असे सण आहेत पण तो घरातल्या घरात आटपायचा विधी आहे त्याचा गुढीसारखं प्रदर्शन होत नाही..

याचं कारण म्हणजे हा सण किंवा विधी हा एवढी वर्षं झाली तरी (ब्राह्मण, आणि पुरोहीतांची involvement नसल्यामुळेच!) “RIGID” किंवा “STRICT” नाही! यामध्ये बाकी कुठल्याही पूजेसाठी लागणारे असले कडक नियम नाहीत दक्षिणा वगरे तत्सम प्रकार नाहीत उगाच गावजेवण नाही तर हा एक freestyle प्रकारचा हा सण आहे..

ज्याला जसं वाटतंय, जेवढी ऐपत आहे, जेवढी इच्छा आहे, तेवढं त्यानी करावं…आणि त्यामुळेच हा विधी एवढा बदलून सुद्धा केवळ लोकमान्यतेमुळे टिकून आहे!

तर..
मातीचा कुंभ असो असो किंवा चांदीचा गढू..
एखादं साधं वस्त्र असो किंवा पैठणी..
खारीक आणि खोबरं असो किंवा साखरेच्या गाठी..
गुढीचं स्थान युगानुयुगे किंवा “संवात्सरानुसंवत्सरे” अढळ राहील यात शंका नाही…!







https://www.maayboli.com/node/65524

|| शालिवाहन शक उर्फ शक-संवताचे उपाख्यान ||

Submitted by वरदा on 7 March, 2018 - 22:02

मध्यंतरी काही वर्षांपूर्वी मायबोलीवर कुणीतरी शालिवाहन-कुंभार-शकनिर्दालन-शालिवाहन शक या दंतकथेवर एक धागा काढला होता. तिथे मी त्या दंतकथेचे ऐतिहासिक वास्तव काय आहे यावर एक प्रतिसाद तपशीलात लिहिला होता. मग पुढची एक दोन वर्षे दर गुढीपाडव्याला फेसबुक किंवा इथेच परत त्या मजकुराचे पुनर्लेखन, दुवे देऊन रिक्षा फिरवणे असे उद्योग केले. गेल्या वर्षी ही रिक्षा फिरवायला जरा संकोचच वाटत होता, पण सध्याच्या वाढत्या ' एकमात्र हिंदू नववर्षाच्या शुभेच्छांच्या' फेसबुकीय आणि वॉट्सॅपीय उन्मादामुळे आवर्जून तपशीलात सोशल मीडियावर लिहिलेच, शिवाय लोकांशी वादविवादही केले. आता बास की! असं माझं मलाच वाटलं आणि तो मुद्दा मागेच पडला डोक्यातून.. पण एकुणात लक्षात आलं आहे की दरवर्षी नेमेचि येणार्‍या पावसाळ्याप्रमाणे अगदी नेमेचि येणारा हिंदू नववर्षाबद्दलच्या चुकीच्या माहितीचा पूर काही थांबणारा नाही. तेव्हा निदान या संबंधीची ऐतिहासिक माहिती काय आहे हे सर्वांसमोर परत एकदा यायलाच हवी म्हणून. माझे गेल्या वर्षीचे प्रतिसाद, उत्तरं, टिपणं असं सगळं एकत्र संकलित करून इथे देते आहे. त्यात मधे मधे जर पुनरावृत्ती झाली किंवा वेगवेगळे परिच्छेद एकत्र केल्याने थोडेसे विस्कळित वाटले तर तेवढं गोड मानून घ्या अशी विनंती...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शालिवाहन नामक कुठलाच राजा कधीच अस्तित्वात नव्हता. सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं. राहिता राहिली एकच खरी गोष्ट की त्यांचा सर्वात बलाढ्य राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहरात कुलातील नहपान नामक अतिशय पराक्रमी शक राजाचा निर्णायक पराभव केला आणि ते राजकुल कायमसाठी संपवलं. मात्र या युद्धाचाही निश्चित असा संबंध शक संवत्सराशी नाही. एकूण पुरावे बघता शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे (शिवाजीच्या राज्याभिषेक शकासारखं) असं दिसतं. या कुलाने गुजरात आणि माळवा प्रांतामधे अनेक वर्षं राज्य केल्यामुळे तेच आसपासच्या प्रदेशांमधे प्रचलित झालं. त्यामुळे त्याचा उल्लेख शक-काल असा केला जाऊ लागला आणि हळूहळू शक हाच शब्द कालगणनावाचक म्हणून रूढ झाला.
त्याकाळी बहुतेक राजे स्वतःच्या राज्यारोहणापासून काळ मोजून तसा अधिकृत दस्तऐवजांमधे (यातील आपल्यापर्यंत फक्त प्राचीन कोरीव लेख आले आहेत) लिहित असत. उदा, सम्राट अशोक आणि ओडिशामधील सम्राट खारवेल यांनी त्यांचे कार्य लिहिताना स्वत:चा राज्यारोहण काळ वापरला आहे - वर्ष अमुकतमुक असा. तशीच कालगणना चष्टनाचीही होती. त्या राजकुलाने गुजरात माळवा भागात पाचव्या शतकापर्यंत राज्य केल्याने तिथे ही कालगणना लोकप्रिय आणि रूढ झाली होती. तशीच ती आसपासच्या प्रदेशांतही रूढ झाली असे दिसून येते. शक-कालाचा सर्वात जुना उल्लेख स्फुजिध्वजाच्या यवनजातकात 'समानाम् शकानाम्' (य.जा. - ७९:१४) आणि कालम् शकानाम्'(य.जा-७९:१५) असा केलेला आढळून येतो. शके १९१ (गत) हा यवनजातकाचा निर्मितीकाळ आहे (य.जा.-७९-६१,६२). शिलालेखांमधे याचा प्रथम उल्लेख 'शक-काल' असा ठाणे जिल्ह्यातील वाला येथील सुकेतुवर्मन नामक भोज-मौर्य राजघराण्यातील राजाच्या शिलालेखात आढळतो. नंतर विदर्भामधील हिस्सेबोराळा येथील देवसेन वाकाटक नृपतीच्या शिलालेखात शकानाम् ३८० असा उल्लेख आढळतो. बदामीचे चालुक्य राजेही शिलालेखांमधे शक-वर्ष, शक-नृपति-राज्याभिषेक-संवत्सर, शक-नृपति-काल असा स्पष्ट उल्लेख करतात. आठव्या शतकातील महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजेही स्पष्टपणे शक-नृप-काल किंवा शक-नृप-संवत्सर असा उल्लेख करतात. एवढेच काय वराहमिहिरानेही बृहत्संहितेत शकेन्द्र-काल आणि शक-भूप-काल असा उल्लेख करून ही कालगणना वापरली आहे...... साधारण नवव्या दहाव्या शतकानंतर याचाच उल्लेख संक्षिप्ताने शक-संवत असा व्हायला सुरू होतो. तो इतका रुळतो की शक याचाच अर्थ कालगणना होतो. म्हणूनच आपण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यारोहणानंतर जी कालगणना सुरू केली त्याला शिवराज्याभिषेक शक म्हणतो
साधारणपणे इ.स. च्या १२व्या शतकापासून (म.प्र. येथील उदयगिरी येथील परमार राजा उदयादित्याचा शिलालेख,पंढरपूरचा शिलालेख, तासगाव ताम्रपट, इ) या काळाचा उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो. तो पंधराव्या शतकापर्यंत चांगलाच रूढ झालेला दिसतो. शकनृपति काळापासून तो शकांना हरवलेल्या शालिवाहनाचे नाव त्याला जोडले जाईपर्यंत तत्संबंधीच्या मौखिक परंपरेत, कथा/दंतकथांमधे कसे आणि मुख्य म्हणजे का बदल झाले हे आत्ता सांगणे थोडे अवघड आहे. त्यात अनुमानाचा भाग जास्त येऊ शकतो.
हा असा आणि इतर विस्तृत शिलालेखीय पुरावा समुच्चयाने असताना शकसंवत्सराला सुरू करणारा कोण याबद्दल फार काही शंका उरते असे वाटत नाही.

आता शक बाहेरचे आक्रमक होते वगैरेही तितकंसं खरं नाही. ते मध्य आशियातून काही शतके आधी आले असावेत असं पुरावे दर्शवतात. पण शक-क्षत्रप आणि सातवाहनांची राज्ये शेजारी शेजारी होती आणि त्यांच्यात व्यापारीमार्गाच्या नियंत्रणासाठी वगैरे कायमच चुरस होती आणि लढाया होत असत. त्यामुळे परकीय आक्रमकांचा पराभव करण्यासाठी गौतमीपुत्राने ती लढाई केली या म्हणण्यात तथ्य नाही. तसेच कार्दमक कुलाशी सातवाहनांचे सोयरिकीचे संबंध होते. त्यांच्या एका राजकन्येशी वासिष्ठीपुत्र पुळुमावि या राजाचे लग्न झालेले होते. याउपर सातवाहनांनी कार्दमकांकडूनही पराभवाचे पाणी चाखले होतेच. या सगळ्या 'जिओपोलिटिकल' कारणासाठी झालेल्या स्थानिक महत्वाच्या लढाया होत्या हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त तो गौतमीपुत्राचा विजय मात्र खरंचच पश्चिम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आठवणींमधे पक्का रुजला. त्याविषयी अनेक दंतकथेची पुटं चढली. आणि मग कधीतरी या पाठोपाठ झालेल्या घटनांचं (नहपानाचा पराभव आणि चष्टनाचं राज्यारोहण) सांस्कृतिक स्मृतीमधे एकीकरण होऊन शक संवत्सराशी शालिवाहन शब्द जोडला गेला......
पुरावे एवढंच सांगतात. वरचे 'हिंदू' नववर्षाचे, शालिवाहनाने हरवून परतवून लावलेल्या आक्रमकांच्या गोष्टीचे इमले हे बरीच शतके नंतर उभारलेले आहेत
(शिवाय आपण दिवाळीत जो किल्ला करतो शिवाजीची आठवण म्हणून, ती प्रथा खरंतर शालिवाहनाने मातीचे पुतळे लहानपणी केले त्याची आठवण म्हणून अस्तित्वात आली असं काही जुनी ब्रिटीश गॅझेटीअर्स नोंद करतात. त्याची शिवाजीशी असलेली असोसिएशन नंतरची आहे.)

आता शकसंवत्सर नेमका गुढीपाडव्याशी कसा संबंधित हा प्रश्न बाकी आहेच!
चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला माहित नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली. आणि भविष्यपुराणात पताका, कमानी (म्हणजेच गुढी. गुढीचा अर्थ ध्वज/पताका) उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही म्हणजे मध्ययुगाच्या थोडे आधीचे वगैरे असूच शकतात.
कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा खरंतर त्या नंतरच आली असणार कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. आणि मग दोन्हीची सांगड बसली असेल.... भारतातील इतर काही प्रदेशात नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं. एकुणच भारतीय पारंपरिक कालगणनेतही प्रादेशिक वैविध्य आहेच. मात्र शकसंवत ही त्यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी कालगणना असावी.

हो, आणि शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्‍या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अ‍ॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे हे आता बहुतांशी विद्वत्मान्य मान्य असलेले मत आहे....

गेले किमान अडीच तीन सहस्रके भारतीय उपखंडांमधे विविध लोकसमूह येतजात आहेत, एक सांस्कृतिक घुसळण कायमच चालू राहिलेली आहे. आक्रमक म्हणून खूप कमी आले. स्थलांतरे करणारे खूप होते. ज्या कुठल्या कारणाने असो, जे आले ते इथलेच झाले. त्यांना आधीच्या इथल्या समाजांनीही खुल्या मनाने स्वीकारले. दुर्दैव असे की त्यांचेच वंशज आपण मात्र आपल्या परंपरांमधे असे बहुपेडित्च असू शकते, आपल्याला माहित असलेल्या 'हिंदू धर्म परंपरांच्या' आणि 'पारंपरिक दंतकथांच्या' बाहेर जाणारे सत्य असू शकते, ऐतिहासिक पुराव्यांनी ते सिद्ध झालेले असते आणि या तथ्यांच्या स्वीकाराने आपल्या संस्कृतीला कुठे उणेपणा येत नाही तर उलट अतिशय समृद्धी आणि संपन्नताच येते हे विसरून गेलो आहोत...

|| इत्यलम् ||

चष्टनाची प्रतिमा असेलेले त्याने पाडलेले नाणे
Coin_of_Chastana.jpg

सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं.
औरंगाबाद, हैद्राबाद, अकोला येथे जमिनीवर आणि कोंडापूर, नेवासे येथे उत्खननात सातवाहन नामक राजाची नाणी सापडली आहेत. त्यावर पुढील बाजूस हत्ती आणि सभोवती 'रञो सिरि सादवाहनस' (राजा श्री सातवाहन) आणि मागील बाजूस उज्जैन चिन्ह आहे. हा सातवाहन घराण्याचा मूळ पुरुष असावा कारण ह्याचेच नाव पुढे कुलाला पडलेले दिसते.

शकांचं दुसरं राजकुल कार्दमक त्यातला महत्वाचा आद्य राजा चष्टन याचं ते राज्यगणना वर्ष आहे
चष्टनाने स्वतःचे राज्यगणना वर्ष सुरु केले हे काहीसे असंभवनीय वाटते कारण चष्टन हा स्वतंत्र राजा नसून क्षत्रप होता. अर्थात क्षत्रपाचा स्वामी सामर्थ्यशाली राजा नसल्याने तो स्वतंत्र झाला होता. अर्थात कोणत्याच प्राचीन संवतांचे (शक्/विक्रम)उल्लेख संस्थापकाच्या नावाने येत नाहीत, तर ते कालांतराने प्रचलित होतात. ह्याच वेळी त्याचा समकालीन असलेल्या नहपानाच्या लेखातही संवताचा उल्लेख आहे ह्याचाच अर्थ चष्टन किंवा नहपान यांचा अधिपती असलेल्या कुणा प्रभावी राजाने हा संवत सुरु केला असला पाहिजे. तो म्हणजे कुशाण वंशीय कनिष्क. कनिष्क हा संवताचा संस्थापक असावा हे मत फर्ग्युसनने मांडले. कनिष्काने आपल्या विशाल भूभागाच्या शासनार्थ विविध क्षत्रपांची नेमणूक केली. कार्दमक, क्षहरात, भूमक ही क्षत्रपांची कुळेच. कनिष्काने आपला संवत सुरु केला होता व हुविष्क्, वासुदेव इत्यादी त्याच्या वंशजांनी तो सुरु ठेवला होता व त्याच्या क्षत्रपांनी देखील त्याचे निष्ठेने पालन केले. कुशाण कमजोर झाल्यावर क्षत्रप स्वतंत्र झाले, मात्र त्यांनी हेच संवत पुढे प्रचलित ठेवल्याने शक हे नामाधिमान त्याला चिकटले असावे असे मानता यावे.

शक संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच विक्रम संवत ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्‍या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अ‍ॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे
हे संवतही माळवा, राजपुताना आदी भागातील शकांनी प्रचलित ठेवले, पुढे शेकडो वर्षांनी चंड्रगुप्त दुसरा अर्थात विक्रमादित्य ह्याने वाकाटक नृपतीची मदत घेऊन तृतीय रूद्रसिंह क्षत्रप याचे राज्य अनुमाने सन ३९५ मध्ये संपूर्णतः खालसा केले व क्षत्रपांच्या भरुकच्छ (भडोच) या राजधानीवर कब्जा केला व माळवा तसेच उत्तर भारत आपल्या ताब्यात घेतला. त्याच्या ह्या पराक्रमामुळेच अ‍ॅझेसने सुरु केलेल्या संवताला विक्रम हे नाव चिकटले असावे.

अतिशय उत्कृष्ट लेख! डोंगरवेडा यांनी लिहिलेली माहिती पण छान! मी बहुतेक तो पाडवा-संभाजी महाराज लेख वाचला. तो मुळातच हास्यास्पद आहे, पण त्याचा उल्लेख करून तुम्ही ही माहिती पुनः संकलित केल्यामुळे असं वाटतं की त्यातल्या मूळ मुद्द्याला अजूनही उत्तर दिले गेले नाही. काही प्रश्न उरतातचः
१. या सगळ्याशी गुढीपाडव्याचा काय संबंध? वेगवेगळ्या संवतांमध्ये नववर्षाची सुरुवात एकाच दिवशी कशी? (काही पंचांगे वेगळी आहेत म्हणा, पण तो वेगळा मुद्दा). की फक्त वर्षगणना राज्याभिषेकानुसार होत असे आणि नवीन वर्ष = चैत्र प्रतिपदा हे आधीपासूनच पक्के गृहीतक आहे?
२. उत्तरेत दिवाळी पाडव्याला राम आयोध्येत आला असे मानतात, आणि आपल्याकडे गुढीपाडव्याला... ह्या गोष्टी कशा रूढ झाल्या?
३. चैत्र प्रतिपदा हे नववर्ष सर्वप्रथम कुणी मानले? का?
४. सुरुवातीलाच तुम्ही म्हणता की शालीवाहन नावाचा कुणी राजा नव्हता. आणि त्याच लेखात पुढे 'शालिवाहनाने मातीचे पुतळे ...' आणि '१२व्या शतकापासून ..... उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो' असे लिहिले आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी ब्रिटीश गॅझेटियर्स आणि परमार राजे यांनी लिहिलेल्या जरी असल्या, तरी ते नक्की कुणाला 'शालिवाहन' म्हणतात? आणि असे नाव का वापरले गेले?

डोंगरवेडा -
१. सातवाहन हे त्या कुलाचं नाव आहे. राजाचं नाव सिरि किंवा श्री आहे. सातवाहन राजाचा मूळपुरुष सिमुक नामक एक राजा होता. सातवाहनांना आंध्रभृत्य असे म्हणले जात असले तरी त्यांचे सुरुवातीचे पुरावे पश्चिम दख्खनमध्येच सापडले आहेत. या विषयात रस असेल तर डॉ शैलेन्द्र भंडारे यांच्या पीएचडीचा प्रबंध वाचा. त्यात त्यांनी नाण्याच्या पुराव्यांचं अतिशय सुरेख विश्लेषण केलेले आहे. हा प्रबंध अ‍ॅकेडेमिया.एज्यु वर उपलब्ध होता, अजूनही असावा
२. कनिष्काने शक संवत सुरू केला हे जुनं मत आहे. हे मत आता विश्वसनीयरीत्या मोडीत निघाले आहे. हॅरी फाल्क यांनी आता कनिष्काच्या राज्यारोहणाचे वर्ष इ स १२७ असावे असे मत मांडले आहे आणि ते बहुतांशीरीत्या मान्य झालेले आहे. ज्यांचे याविषयी मतभेद आहेत तेही कनिष्काने शक संवत सुरू केला हे आता म्हणत नाहीत.

शंतनू
१. चैत्र प्रतिपदेशी शक संवत नेमका कसा जोडला गेला ते अचूकपणे आपल्याला माहित नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्नदेवाने विश्वनिर्मिती केली. आणि भविष्यपुराणात पताका, कमानी उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चारपाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे असे म्हणता येत असले तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही असूच शकतात.
कदाचित असे असू शकेल की पारंपरिकरीत्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा नंतरच आली असणार कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि कालगणनेचे वर्ष शकांकडून आले तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले तरी वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. काही प्रदेशात नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं.
२. रामाची गोष्ट कुठे कशी रूढ झाली किम्वा याच्याशी जोडली गेली यावर माहिती उपलब्ध नाही. त्यासाठी कुणाला तरी जेठा मारून बसून नव्याने काम करावं लागेल बहुदा
३. शालिवाहन असा राजा नसला तरी सातवाहन या नावाचे प्राकृत रूप शालिवाहन किंवा सालाहण हे आपल्याला ७व्या ८व्या शतकापासून दिसू लागते. शालिवाहन राजा प्रतिष्ठान नगरीत राज्य करत असताना अशी अगदी टिपिकल सुरुवात करून बर्‍याच दंतकथा/मिथककथा नंतरच्या साहित्यात आपल्याला दिसून येतात. त्या सातवाहन कुलाची ती सांस्कृतिक आठवण मिथककथेमधे एका राजाच्या रूपात साठवली गेली आहे असे आपण म्हणू शकतो

हिम्सकूल -
वेदकाळापासून आपल्याला महिन्याची आणि तिथीची गणना होत असे दिसून येते. वेदातल्या उल्लेखानुसार फाल्गुन पौर्णिमेनंतरच्या दिवसाला नवे वर्ष सुरू होत असे म्हणे. ही चांद्रमासीय कालगणना होती आणि पाच वर्षांच्या कालावधीत दोनवेळा अधिकमास मिळवला जात असे. मात्र कशा पद्धतीने त्याचे तपशील आपल्याकडे नाहीत.
जाता जाता - अवांतर वेदाच्या भाषेत युग म्हणजे पाच वर्षांचा काळ (इथेही वर्षाला संवत्सर म्हणले जात असे)

माझ्या हाताशी आत्ता सर्व संदर्भ ग्रंथ नाहीत तेव्हा जशी आठवेल तशी माहिती इथे लिहिली आहे. किंचित कुठे चुभू असू शकते, पण माझ्या स्मृतीप्रमाणे तपशील बरोबर आहे.



















शालिवाहन म्हणजेच सातवाहन. शालिवाहन हे संस्कृतीकरण आहे. साळीहन हे मूळ प्राकृत भाषेतलं नाव. जैन साहित्यामध्ये सालाहन असे म्हटले आहे. त्याचे संस्कृतीकरण जेव्हा झाले, तेव्हा ते शालीवाहन झाले," असे शालिवाहन साम्राज्याचे अभ्यासक इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी एका मुलाखतीत बोलताना उल्लेख केला होता.

शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन'असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहन हे नाव मूळचे छातवाहन. म्हणजे पर्वतनिवासी. सातकर्णी हाही मूळचा प्राकृत शब्द 'सादकनी' असाच आहे. तत्कालीन शिलालेखांमध्येही अशीच नोंद आहे, या शब्दांना संस्कृतात कसलाही अर्थ नाही. पण त्याचे रुपांतर सातकर्णी असे केले गेले. संस्कृतीकरणाच्या नादात इतिहास कसा हरवतो याचे हे एक उदाहरण आहे.






सातवाहन हे नांव कसे व कोठून आले याबाबत विद्वानांनी खूप वाद घातला आहे. सातवाहन हे घराणे नंतर सातकर्णी नांवानेही ओळखले जाऊ लागले. शिलालेखांत या वंशाचे नांव सादवाहन, सदकनी असेही आले असे असून संस्कृत ग्रंथांत सातवाहन, सातकर्णी, शातवाहन असेही आले असले तरी या नांवाची व्युत्पत्ती काय हे मात्र कोडेच आहे असे डा. अजयमित्र शास्त्री म्हणतात. वाहने वाटतो म्हणून सातवाहन असे जसे म्हटले जाते तसे जे. प्रिझलुक्सी यांच्या मताप्रमाणे "सादम" या मुंड भाषेतील शब्दावरुन हा शब्द आला आहे व त्याचा अर्थ घोडा असा होतो. अशा अनेक व्युत्पत्त्या शोधायचा प्रयत्न राजवाडेंपासून के. गोपालाचारींनी केला असला तरी या नांवाची उत्पत्ती लागलेली नाही. कारण सर्व विद्वानांनी संस्कृतात या शब्दाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला आहे. इसवीसनापुर्वी मुळात संस्कृत भाषाच तयार झालेली नव्हती तर संस्कृतात त्याची उत्पत्ती सापडेल कशी? (पहा- भाषेचं मूळ-संजय सोनवणी) वा. वि. मिराशी म्हणतात कि, सातवाहन हेच मुळचे नांव असून त्याची व्युत्पत्ती काहीही असो. या वंशनामाच्या इतर व्युत्पत्त्या काल्पनिक आहेत. (सातवाहन आणि पश्चिमी छत्रप)

 सातवाहन या शब्दाचे मूळ आपल्याला प्राकृतातच व जसे आहे तसेच स्विकारावे लागते. सादकणीचे कृत्रीम रूप संस्कृतात सातकर्नी करुन "सात कानांचा असा अर्थही कसा चुकीचा होतो असे विद्वानांनीच मान्य केले आहे.  थोडक्यात सातवाहन या नांवाचा (जसा महाराष्ट्रातील अनेक आडनांवांचा आज अर्थ लागत नाही.) अर्थ शोधत बसणे निरर्थक आहे.


अशा अशक्यप्राय विजयाची स्मृती गौतमीपुत्राने स्वतंत्र संवत निर्माण करुन ठेवणे स्वाभाविक होते व तसे सातवाहनांनी केलेही. (याच गौतमीपुत्रासाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याने आपल्या नावाआधी शकारि ही उपाधी लावल्याने सिद्ध होते) अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. प्राकृत भाषांना भ्रष्ट करत इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले.

सत्य हे आहे की शालिवाहन हा मुळचा शब्द नसून तो 'सालाहन' असा आहे आणि तसे स्पष्ट उल्लेख करणारी सातवाहनकालीन शिलालेख व नाणीही अस्तित्वात आहेत. सातवाहन हे माहाराष्ट्री प्राकृताचे भोक्ते होते. संकृत अजून जन्मालाच यायची होती. सालाहन शक हाच मूळचा शब्द असून (साल + हन + शक) 'ज्या साली शकांचे हनन केले ते साल' (वर्ष अथवा संवत्सर)! ज्या दिवशी ही घटना घडली तो वर्षारंभ! म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.

आपण दरवर्षी जी गुढी उभारतो ती गौतमीपुत्राच्या नहपानावरील विजयाची आठवण म्हणून. गुढी उभारताना गौतमीपुत्र सातकर्णीची आठवणही जरूर ठेवायला हवी



             ( Photo - Wikipedia )






संदर्भ 
१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) मुसलमानपूर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - वा. कृ. भावे
 

संदर्भ 
१) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
२) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर
३) मुसलमानपूर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - वा. कृ. भावे













गौतमीपुत्र सातकर्णी

सातवाहन वंशाच्या ३० राजांची यादी उपलब्ध असली, तरी त्यांच्यापैकी सर्वांत कर्तृत्ववान आणि श्रेष्ठ राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. सातकर्णी हे तर आधीपासूनच उपनाम म्हणून वापरलेले आहे. आणि हा वंश मातृसत्ताक असावा, असे दिसते. राजाच्या आईचे नाव ‘गौतमी बलश्री’. त्यामुळे तो स्वत: ‘गौतमीपुत्र!’ आंध्र राजांच्या विविध याद्यांचा समन्वय केला, तर गौतमीपुत्र हा सिमुकापासून २३ वा राजा ठरतो.

‘अप्रतिहतचक्र’ अशी त्याची उपाधी होती. त्याचा शासनकाळ कोणता, यावर अनेक मतांतरे आहेत. पण, इ. स. ६०/७० ते ८५/९५ या दरम्यान केव्हा तरी तो असावा. एक जनमान्य समज- विशेषत: दक्षिण भारतात असा आहे, की शालिवाहन हे गौतमीपुत्राचेच एक प्रचलित नाव होते; आणि त्याने इ. स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे बलाढ्य शक क्षत्रप ‘नहपान’ याचा समूळ नाश केला आणि याच विजयाच्या स्मरणार्थ तेव्हापासून ‘शालिवाहन शके’ ही कालगणना सुरू झाली.

म्हणून शक वर्ष आणि इसवी सन यांत ७८ वर्षांचे अंतर असते. हा सिद्धांत काही संशोधकांना मान्य नाही. शक ही कालगणना शक क्षत्रपानेच अथवा कुशाण राजा कनिष्काने सुरू केली, असे त्यांचे म्हणणे आहे. ही मतांतरे बाजूला ठेवली तरी गौतमीपुत्र सातकर्णीची कारकीर्द ही सातवाहन वंशाचा सुवर्णकाळ होता, कीर्तीचे शिखर होते हे निर्विवाद!




No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...