Tuesday, November 25, 2025

पूर्वमध्ययुगीन तेर

तेर आणि परिसर

      महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांकरिता प्रसिद्ध असलेले एक ऐतिहासिक शहर. हे धाराशिव जिल्ह्यात धाराशिव शहराच्या ईशान्येस ३२ किमी.वर तेरणा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे. त्याचे प्राचीन नाव तगर, तगरपूर वा तगरनगर असून तगरचे पुरावशेष नदीच्या दोन्ही तीरांवर एकूण नऊ पांढरीच्या टेकाडांवर सांप्रत आढळतात. जगभरातील पुरातत्त्वीय अभ्यासक, इतिहासकार, कला अभ्यासक यांना तेर पूर्वीपासूनच सुपरिचित आहे ते तेर येथील रामिलगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयामुळे. रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे यांना येथे सापडलेल्या प्राचीन कलात्मक वस्तूंच्या संग्रहामुळेच महाराष्ट्र शासनाने येथे संग्रहालय उभारले आहे.याशिवाय तेरणा नदीकाठी असलेले संत गोरा कुंभार (गोरोबाकाका) यांचे मंदिर, त्याच्या बाजूलाच असलेले चालुक्यकालीन शिव मंदिर, पूर्णपणे विटांनी बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव उत्तरेश्वर मंदिर व एखाद्या चत्याप्रमाणे रचना असलेले महाराष्ट्रातील एकमेव त्रिविक्रम मंदिर, नृसिंह मंदिर ही ठिकाणे भटकंतीचा आनंद द्विगुणित करतात.याच तेर परिसराची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. 
             सह्याद्री आणि सातमाला पर्वतांच्या दर्‍यांमध्ये असलेली लेणी म्हणजे एकेकाळचे बौद्ध मठ होते. या पैकी बहुतेक मठांमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य एके काळी होते. या बौद्ध लेण्यांचे त्यांच्या भौगोलिक स्थानाप्रमाणे दोन गट करता येतात. यापैकी पहिला म्हणजे दक्षिणेकडे असलेल्या कार्ले, भाजे, शेलारवाडी, जुन्नर, कोंडाणे या लेण्यांचा एक गट होतो. दुसर्‍या किंवा उत्तरेकडच्या लेण्यांच्या गटात नाशिक, पितळखोरे आणि जगप्रसिद्ध अजंठा लेण्यांचा समावेश करता येतो.
    त्या कालातील बौद्ध धर्माच्या नियमांप्रमाणे, बौद्ध भिख्खूंनी कोणत्याही प्रकारची म्हणजे स्थावर किंवा जंगम मालमत्ता प्राप्त करण्यास आणि बाळगण्यास संपूर्णपणे बंदी होती. त्याचप्रमाणे उदरनिर्वाहासाठी अत्यावश्यक असलेले अन्न आणि शरीरावर धारण करण्याची वस्त्रे ही सुद्धा समाजाकडून दान म्हणूनच मिळालेली असली पाहिजेत असेही कडक बंधन या बौद्ध भिख्खूंवर असे. हे नियम बघितल्यास, मनात साहजिकच असा प्रश्न उभा राहिल्याशिवाय रहात नाही की इ.स. पहिल्या शतकाच्या आसपास सह्याद्री पर्वताच्या कडेकपार्‍यांत व अत्यंत दुर्गम ठिकाणी स्थापना झालेल्या या बौद्ध मठात मोठ्या संख्येने वास्तव्यास असणारे हे बौद्ध भिख्खू, आपला उदरनिर्वाह कसा काय चालवत असतील? मागच्या शतकातील एक विद्वान व्यासंगी, कै. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी 1955 मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'जर्नल ऑफ द बॉम्बे ब्रॅन्च ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी' च्या अंकात या प्रश्नाचे एक सोपे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. प्रो. कोसंबी यांच्या मताप्रमाणे हे सर्व मठ त्या काली जे महत्त्वाचे व्यापार मार्ग होते त्यांच्या जवळच स्थापन केले गेले होते. त्याचप्रमाणे ज्या मठात मोठ्या संख्येने भिख्खू वास्तव्यास होते असे मठ जेथे असे दोन किंवा त्याहून जास्त व्यापारी मार्ग एकत्र येत होते अशा ठिकाणांजवळच फक्त स्थापन केले गेले होते. या रस्त्याने ये जा करणार्‍या व्यापारी मंडळींनी केलेल्या दानधर्मातून या बौद्ध मठांची गुजराण सहजपणे होत होती. प्रो. कोसंबी यांच्या मताने हे मठ या व्यापाऱ्यांना, सुरक्षा, व्यापारासाठी भांडवल पुरवठा, या सारख्या अनेक सेवा उपलब्ध करून देत असत व त्या बदल्यात त्यांना या व्यापार्‍यांकडून देणग्या सहजपणे मिळू शकत. अर्थात हा खुलासा ग्राह्य मानला तर असे प्रश्न उपस्थित होतात की एवढ्या मोठ्या संख्येने स्थापन झालेल्या या बौद्ध मठांना एवढा सशक्त आर्थिक आधार देऊ शकत असणारा हा व्यापार कोणामध्ये आणि काय प्रकारचा होता? या प्रश्नाचे उत्तर इतिहासाची थोडीफार जाण आणि आवड असणार्‍या बहुतेक वाचकांना ज्ञात असेलच. हा व्यापार अर्थातच सातवाहन साम्राज्य आणि रोमन साम्राज्य यांमध्ये चालत होता.
ज्येष्ठ प्लायनी (Gaius Plinius Secundus) ही इ.स. 23 ते 79 या कालखंडात होऊन गेलेली एक सुप्रसिद्ध रोमन व्यक्ती! तत्त्वज्ञानी, लेखक आणि सुरवातीच्या कालातील रोमन पायदल-नौदलाचा कमांडर, अशा अनेकविध अंगांनी प्रसिद्धी मिळालेला प्लायनी, निसर्गनिष्ठ जीवनशैलीचा मोठा भोक्ता होता. रोमन साम्राज्याच्या अत्यंत विषम स्वरूपाच्या व्यापारउदीमाबद्दल तो काय लिहितो ते पाहूया.
    "आपण आणि विशेषेकरून आपल्या समाजातील स्त्रिया हे सर्व उपभोगत असलेल्या चैनीच्या आणि उपभोगांच्या वस्तूंची आपल्याला ही मोठी किंमत द्यावी लागते आहे. आताच्या हिशोबाप्रमाणे 10 कोटी सेस्टर्स (sesterces) भारत, चीन आणि अरबस्तान हे प्रतिवर्षी आपल्याकडून मिळवतात. रोम आणि भारत यांमधील व्यापाराचा निम्मा हिस्सा असणार्‍या चैनीच्या आणि उपभोगांच्या वस्तू आणणारी 40 जहाजे, दर वर्षी भारतातून रोमकडे रवाना केला जातात. भारतातून आयात केल्या जाणार्‍या वस्तुंमध्ये, मसाले, मोती, मलमल, हस्तिदंत यांचा समावेश असतो. रोमहून निर्यात केल्या जाणार्‍या गोष्टी अतिशय मर्यादित प्रकारच्या असतात व त्यात मदिरा, वाद्ये, गाणारे तरूण आणि नर्तकी यांचाच फक्त समावेश असतो. हा व्यापार इतका विषम आहे की रोमला दरवर्षी सोन्याच्या स्वरूपात भारताला मोठी रक्कम अदा करावी लागते."
  'पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' हा इसवी सनाच्या पहिल्या ते तिसर्‍या शतकांमध्ये लिहिला गेलेला एक ग्रंथ आहे व तो मार्को पोलोच्या प्रवासवर्णनाइतकाच महत्त्वपूर्ण मानला जातो. या ग्रंथात रक्त समुद्राच्या किनार्‍यावर असलेल्या "बेरेनिस" सारख्या इजिप्शियन किंवा रोमन बंदरातून नांगर उचलणार्‍या दर्यावर्दी जहाजांनी समुद्रातून मार्ग कसा काढायचा? आणि त्यांना ईशान्य आफ्रिका किंवा भारतीय उपखंडात व्यापाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात ? याबद्दल माहिती दिलेली आहे. व्यापाराच्या स्वरूपाबद्दल पेरिप्लस हा ग्रंथ म्हणतो:
     " या बंदरात आयात केलेल्या गोष्टीत मदिरा (इटली मध्ये बनवलेल्या दारूला प्राधान्य दिले जाते.) याशिवाय सिरियन किनार्‍यावरच्या लाओडिकन किंवा अरबस्थानात बनवलेल्या मदिरा, तांबे, कथील, शिसे, कोरल व टोपाझ, तलम आणि जाड वगैरेसारखे सर्व प्रकारचे कापड, bright-colored girdles a cubit wide; storax, sweet clover, flint glass, realgar, अ‍ॅन्टिमनी, ज्यांची देशातील चलनाबरोबर देवघेव केल्यास फायदा होऊ शकतो अशी सर्व प्रकारची सोने व रुपे यांची नाणी , चेहरा आणि अंग यावर सौंदर्य प्रसाधनासाठी चोपडण्याची पण फार महाग नसलेली मलमे असतात. राजे महाराजे यांच्या साठी आयात केलेल्या वस्तूत अतिशय महाग असलेली रुप्याची भांडी, तरूण गायक, जनानखान्यासाठी सुंदर तरूणी, उच्च प्रतीची मदिरा, अतिशय तलम असलेली वस्त्रे-प्रावरणे आणि अत्यंत महाग मलमे असतात. येथून निर्यात केलेल्या वस्तूत spikenard, costus, bdellium, हस्तीदंत, , agate and carnelian, lycium, सर्व प्रकारची सुती वस्त्रे, रेशमी कापड, जाडेभरडे कापड, सूत, या सारख्या (इतर बाजारपेठांतून आयात केलेल्या) वस्तूंचा समावेश असतो."
     भारताच्या पश्चिम किनार्‍यावरच्या ज्या बंदरांजवळ रोमन जहाजे नांगर टाकत असत त्या बंदरांचाही उल्लेख पेरिप्लस मधे आहे. या बंदरांमध्ये सर्वात उत्तरेकडे असलेले नर्मदा नदीच्या मुखाजवळचे बंदर, भडोच (Barygaza) हे होते. या बंदराच्या दक्षिणेस असलेल्या भूभागाचा उल्लेख पेरिप्लस मधे दक्षिणदेश (Dachinabades) असा केलेला आढळतो. पेरिप्लस मधे उल्लेख असलेली दक्षिणदेशातील प्रमुख बंदरे, सोपारा (Suppara) कल्याण (Celliana) आणि चौल (Semylla) ही आहेत. परंतु ज्या बाजारपेठांकडून निर्यात करण्याचा माल या बंदरांकडे पाठवला जात असे त्या बाजारपेठा कोठे होत्या? मात्र पेरिप्लस मधे फक्त दोन महत्त्वाच्या बाजारपेठांचा उल्लेख आढळतो.
       " दक्षिणदेशातील बाजारपेठांपैकी दोन गावे सर्वात महत्त्वाची आहेत. यापैकी पैठण (Paethana) हे गाव भडोच पासून पूर्वेकडे 20 दिवस प्रवासाच्या अंतरावर आहे. त्याच दिशेने आणखी 10 दिवस प्रवास केल्यावर एक अतिशय मोठी बाजारपेठ असलेले "तगर" हे गाव आहे. या दोन्ही बाजारपेठांवरून निर्यातीसाठीचा माल, (‌बैल)गाड्यांमार्फत किंवा रस्ते नसलेल्या मोठ्या प्रदेशातून भडोचला आणला जातो. पैठणहून मोठ्या प्रमाणात carnelian आणले जातात तर तगरहून आणलेल्या मालात, मलमल, जाडेभरडे कापड आणि समुद्र किनार्‍याजवळच्या भूभागातून आणलेला, (ज्यात अनेक प्रकारच्या व्यापारी मालाचा समावेश असतो,) याचा समावेश होतो. (भडोचपासून) तमिळ लोकांच्या प्रदेशाच्या अगदी शेवटच्या भागापर्यंत प्रवास करायचा असला तर ते अंतर 7000 स्टेडिया( 700 मैल) तरी आहे, परंतू समुद्र किनार्‍याजवळचा भाग मात्र आणखी दूर आहे."


सातवाहनकालीन व्यापारी मार्ग ( इ.स. पुर्व २०० ते इ.स. ३०० )

       मात्र भारताच्या भूमीवर हा व्यापारी माल कोणत्या मार्गांनी ( Land routes) नेला जात असे याचा उल्लेख पेरिप्लस मध्ये नाही. परंतु कै. दामोदर कोसंबी यांच्या विचारांप्रमाणे, जर त्या कालात पर्वतराजींमध्ये स्थापन झालेले बौद्ध मठ या व्यापारी मार्गांजवळच स्थापले गेले होते हे मान्य केले तर आपण निदान दोन व्यापारी मार्गांची तरी कल्पना करू शकतो. हे दोन्ही मार्ग अर्थातच पैठण किंवा तगर पासून निघत असणार. यापैकी दक्षिणेकडचा मार्ग जुन्नर शहरापर्यंत येऊन सह्याद्री पर्वतराजीमधील दुर्गम अशा घाट रस्त्यांनी कल्याण किंवा चौल या सारख्या बंदरांकडे जात असला पाहिजे तर उत्तरेकडचा व्यापारी मार्ग पैठणहून अजंठा- कन्नड घाटातील पितळखोरे- मार्गे भडोचकडे जात असला पाहिजे. पेरिप्लस मधील उल्लेखावरून हे ही स्पष्ट होते की तगर ही बाजारपेठ, भारताच्या पूर्व किनार्‍यावरील प्रदेशात उत्पादित मालासाठी अत्यंत महत्त्वाची होती.
      गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी या ग्रंथाच्या खंड 16 पृष्ठ 181 वर सर जेम्स कॅम्पबेल यांनी हे भूमीवरील व्यापारी मार्ग कसे जात असावेत यासंबंधीचे आपले खालील विचार प्रगट केलेले आहेत:
       "पेरिप्लस मधे असलेला (किनारपट्टीच्या भागातून तगर येथे आणलेला व्यापारी माल (बैल)गाड्यांनी भडोच येथे पाठवला जातो) हा उल्लेख हे स्पष्टपणे दर्शवतो की तगर आणि बंगालच्या उपसागरा- -लगतची भारताची किनारपट्टी यामध्ये व्यापारी संबंध होते आणि तगर हे पूर्व किनार्‍यावरून भडोचकडे नेल्या जाणार्‍या व्यापारी मालाची ने-आण करण्याच्या मार्गावरचे महत्त्वाचे केंद्र होते. तगर मधून होणार्‍या व्यापारामुळे मछलीपट्टण, मालखेत, कल्याण, बिदर, गोलकोंडा आणि हैदराबाद या सारख्या ठिकाणचा व्यापारउदीम वाढला असल्याने ही ठिकाणे संपन्न बनली होती."
    'जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी' या वार्षिकाच्या 1901 च्या अंकात ( पृष्ठे 517-552) लिहिलेल्या एका लेखात जे.एफ.फ्लीट यांनी हे व्यापारी मार्ग कोणते असावेत याबद्दलचे आपले विचार प्रथम मांडले होते. त्यांच्या विचारांप्रमाणे पहिला व्यापारी मार्ग मछलीपट्टण (16d 11' N., 81d 8' E.),) तर दुसरा विनूकोंडा (16d 3' N., 79d 44' E) या ठिकाणांहून सुरू होत असे व हैदराबादच्या दक्षिणेला सुमारे 25 किमी अंतरावर हे दोन्ही मार्ग एकत्र होत असत. तेथून हा उत्तरेकडचा मार्ग तगर-पैठण-दौलताबाद मार्गे अजंठा टेकड्यांजवळील मरकिंद येथपर्यंत जात असे. यापुढचे 100 मैल हा मार्ग सातमाला व सह्याद्री पर्वतराजींतील दुर्गम प्रदेशामधून भडोचकडे जात असल्याने व्यापारी काफिल्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. मात्र सातवाहन साम्राज्याच्या व्यापाराच्या राजमार्गाचे स्वाभाविक अखेरचे स्थान कल्याण बंदर हेच होते.
    जर कल्याण बंदर हे स्वाभाविक अखेरचे स्थान असले तर व्यापारी काफिले 100 किमी लांब पडणार्‍या उत्तर मार्गाने का जात होते? या प्रश्नाचे उत्तर त्या कालातील राजकीय परिस्थितीमध्ये मिळते. दख्खन मधील राजकीय परिस्थिती त्या काली मोठी अस्थिर बनली होती. शक क्षत्रप नहापन याच्या सैन्याने सातवाहन राज्याचा मोठा मुलुख तेंव्हा जिंकून घेतला होता व त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर व कल्याण सारख्या बंदरांवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. पेरिप्लस मध्ये या गोष्टीचाही उल्लेख आहे. जे.एफ. फ्लीट या बाबत लिहितात की गुजराथ मधे आपले बस्तान बसवलेल्या शकांनी कल्याण बंदराकडे जाणार्‍या व्यापारी काफिल्यांना अडचणी निर्माण केल्याने, ग्रीक व्यापार्‍यांना अत्यंत कष्टप्रद अशा भूप्रदेशातून व पर्वतांमधून भडोचकडे जाणारा (अजंठा-पितळखोरे) मार्ग वापरावा लागत होता.
    या सर्व विवेचनावरून रोम आणि सातवाहन साम्राज्य यामध्ये चालत असलेल्या व्यापाराबद्दल बरीच कल्पना वाचकांना आली असेलच. पेरिप्लस मध्ये वर्णन केलेल्या सर्व ठिकाणांचा, एक अपवाद वगळता, अचूक ठावठिकाणा अणि सद्यःस्थितीतील त्यांचे स्वरूप हे आपल्याला सहजपणे सांगणे शक्य होते. मात्र याला असलेला एकुलता एक अपवाद म्हणजे त्या काली अत्यंत संपन्न असलेले तगर या व्यापारी केंद्राचा आहे असे म्हणता येते.

पेरिप्लस सारख्या ऐतिहासिक दाखल्यांवरून हे स्पष्ट होते की भारताच्या पूर्व किनार्‍यावर उत्पादन झालेला माल, ग्रीक किंवा रोमन व्यापाऱ्यांना विकण्यासाठी "तगर" ही अत्यंत महत्त्वाची अशी एक बाजारपेठ होती. हा माल प्रथम तगर मधले व्यापारी खरेदी करत असत व तो नंतर निर्यातीसाठी विकत असत. सातवाहन कालातील व्यापारी मार्गांवर असलेली इतर शहरे आणि बाजारपेठा, सध्या कोणत्या नावांनी अस्तित्वात आहेत हे पुरातत्त्व शास्त्रज्ञांना ओळखणे शक्य झालेले असले तरी तगर बाजारपेठेची ओळख सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्या ठिकाणाबरोबर करायची? हे कोडे विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत किमान एक शतक तरी न उलगडल्याने, तगर हे पुरातत्त्व शास्त्रज्ञांसाठी एक मोठे आव्हान राहिले होते.
     सातवाहन काळामध्ये तगरला बाजारपेठ म्हणून महत्त्व होतेच पण इतकेच नव्हे तर या नंतरची किमान एक सहस्र वर्षे तरी तगर शहराने आपले महत्त्व टिकवून ठेवले होते. या संदर्भात या आधी उल्लेख केलेल्या, जे. एफ. फ्लीट ( इंडियन सिव्हिल सर्व्हिस मधील एक ब्रिटिश अधिकारी) यांच्या 1901 सालच्या जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी या वार्षिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामधील खालील मुद्दे मी उद्धृत करू इच्छितो.
      इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या मध्य कालात लिहिलेल्या आपल्या ग्रंथात ग्रीक भूगोल तज्ञ टॉलेमी याने तगर शहराचा उल्लेख करून त्याचे अक्षांश-रेखांश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरून तगर हे शहर, त्याने बैथन (Baithana) असा उल्लेख केलेल्या एका ठिकाणाच्या आग्नेयेकडे सत्याऐंशी मैलावर आणि भडोचच्या (Barygaza) आग्नेयेकडे, दोनशे सत्तर मैलावर असले पाहिजे असे अनुमान काढता येते. बैथन म्हणजे अर्थातच पैठण असले पाहिजे.
       पश्चिम चालुक्य राज वंश कालामधील, इ.स.612 मधे केल्या गेलेल्या एका नोंदीप्रमाणे, त्या नोंदीत उल्लेख केलेल्या व्यक्तीला एक गाव इनाम दिले असल्याचा उल्लेख आहे. ही व्यक्ती तगर या शहराची रहिवासी असल्याचे या नोंदीत म्हटलेले आहे.
    इ.स.997 मधील एका नोंदीप्रमाणे, उत्तर कोकणचा शिलाहार घराण्यातील राजा अपराजित याचा उल्लेख तेथे तगर-पूर-परमेश्वर (तगर नगरीचा सर्वश्रेष्ठ भूपाल) असा केलेला आहे. ही वंशपरंपरागत चालत आलेली पदवी राजाच्या तगर या मूळ गावाचा आदर राखण्यासाठी त्याला दिलेली होती असे दिसते.
       इ.स.1058 मधील एका नोंदीप्रमाणे, शिलाहार राजघराण्यातील कर्‍हाड पातीच्या मरसिंह (नरसिंह?) या राजाला तगर-पुरवर- अधिश्वर (सर्वोत्तम असलेल्या तगर नगरीचा सर्वश्रेष्ठ भूपाल) अशा पदवीने संबोधलेले आढळते. या राजाच्या आज्याचा (दुसरा जतिग) उल्लेख याच नोंदीमध्ये अधिक स्पष्टपणे पण कमी अचूकतेने, तगर-नगर- भूपालक (तगर नगरीचा राजा) असा केलेला आहे.
       सध्या अस्तित्वात असलेल्या गावांपैकी एखाद्या गावाचा तगर नगरीशी संबंध लावण्याचा सर्वप्रथम प्रयत्न, 1787 मधे फ्रान्सिस विल्फोर्ड याने केला होता. तगर म्हणजे देवगिरी किंवा दौलताबाद असले पाहिजे असे प्रतिपादन त्याने केले होते. त्यानंतर एका शतकाने, जे. बर्जेस याने 1880 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या 'केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया' या पुस्तकात सध्याचे जुन्नर शहर हे ग्रीक लेखकांनी उल्लेख केलेले तगर असावे असा विचार मांडला होता. या दाव्याचे समर्थन बर्जेस यांनी जुन्नर जवळ तीन पर्वत आहेत आणि तगर हा शब्द त्रिगिरी या शब्दापासून आला असावा अशा तर्काने केले होते. त्याच सुमारास किंवा 1875 मध्ये, कोल्हापूर संस्थान व दक्षिण मराठी प्रदेशाचे असिस्टंट पोलिटिकल एजंट असलेले जे.एफ.फ्लीट यांनी करवीर म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर शहर, हे तगर असले पाहिजे असे अनुमान बांधले होते.
        1955 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या लेखात, कै. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी, जे. बर्जेस यांच्या जुन्नर हेच तगर असले पाहिजे, या तर्काच्या मागे त्यांनी दिलेले कारण पुरेसे समर्थनीय वाटत नाही हे मान्य केलेले होते. पण तरीसुद्धा जुन्नर हेच तगर असावे असे आपल्याला वाटते असेही त्यानी म्हटले होते. यासाठी त्यांनी दिलेली कारण मीमांसा अशी होती की जर जुन्नर हे तगर नसते तर पेरिप्लस किंवा टॉलेमी यांनी ज्या ग्रीक-रोमन व्यापाऱ्यांच्या कथनावरून आपली माहिती मिळवली होती ते व्यापारी दख्खन मधील सर्वात मोठ्या बाजारपेठेचा (जुन्नर) साधा उल्लेख देखील आपल्या कथनात करत नाहीत हे संभवनीय वाटत नाही. मात्र 1981 मधील आपल्या लेखात सॅम्युएल क्लार्क लाउचली हे कै. कोसंबी यांच्या विचाराचे खंडन करताना म्हणतात की पेरिप्लस सारख्या जुन्या लिखाणांत, जुन्नरचा उल्लेख बहुधा " ओमेनगर" किंवा तत्सम नावाने केलेला आहे आणि त्यामुळे जुन्नर असा उल्लेख कोठेही सापडत नाही यात काही नवल नाही.
    आधीच्या कालात कोल्हापूर संस्थानाचे पोलिटिकल एजंट असणारे जे.एफ.फ्लीट, यांनी 'जर्नल ऑफ द रॉयल एशियटिक सोसायटी' या वार्षिकाच्या जुलै 1901 मधे प्रसिद्ध झालेल्या लेखात, असे प्रथम सुचवले की तेरणा नदीच्या काठावर असलेले आणि सध्या "तेर" या नावाने ओळखले जाणारे एक खेडेगाव, पुरातन कालातील तगर हे शहर असावे. यासाठी त्यांनी अशी कारणे दिली की "तेर" गाव पैठणच्या आग्नेयेकडे 95 मैलावर आहे व हे अंतर, पेरिप्लस मधे दिलेली दिशा आणि अंतर यांच्याशी बरोबर जुळते आहे. नकाशाप्रमाणे भडोच ते पैठण अंतर 240 मैल आहे आणि पैठण ते तेर अंतर 104 मैल आहे. साधारण दिवसाला 12 मैल एवढा प्रवास गृहीत धरला तर पैठणला जाण्यासाठी 20 दिवस आणि पुढे तेरला जाण्यासाठी 9 दिवस दिवस लागतील. सध्याच्या तेर या खेडेगावाच्या स्थानी पुरातन तगर हे शहर असले पाहिजे ही बाब यानंतर सर्वमान्य होत गेली.
    हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर, जे.एफ.फ्लीट यांनी भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये सुपरिटेंडेंट- आर्टिस्ट आणि पुरातत्त्व छायाचित्रकार म्हणून पद भूषवणारे हेनरी कुझेन्स यांना अशी विनंती केली की त्यांनी शक्य तितक्या लवकर तेर गावाचा दौरा करावा व तेथे पूर्वी अस्तित्वात असणार्‍या एखाद्या प्राचीन शहराच्या खाणाखुणा किंवा काही भग्नावशेष अजून अस्तित्वात आहेत का हे बघावे, ज्या योगे तेर म्हणजेच तगर ही खात्री करून घेता येईल. या विनंतीनुसार नोव्हेंबर 1901मध्ये कुझेन्स यांनी तेर गावाचा एक झटपट दौरा केला. तेर हे खेडेगाव सोलापूर जिल्ह्यामधल्या कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बार्शी शहराच्या पूर्वेला सुमारे 48 किमी वर आणि उस्मानाबाद तालुक्यात वसलेले आहे. कुझेन्स यांची या दौर्‍यात एकूण बघता निराशाच झाली कारण कोणताच थेट पुरावा त्यांच्या हाताला लागला नाही. ते एवढेच सांगू शकले की तेर हे गाव प्राचीन असून तेथे वैदिक, जैन आणि बौद्ध धर्मियांच्या पूजास्थानांचे भग्नावशेष आढळून येतात.

तेर येथे दिसलेल्या प्राचीन खाणाखुणांनी कुझेन्स अत्यंत प्रभावित झाला होता. त्याने नंतर तेरच्या आसमंतात असणार्‍या इतर मंदिरांनाही भेटी दिल्या व भेटी अंती लिहिलेल्या आपल्या अहवालात तो म्हणतो:
        " माझी भेट अगदी कमी काळाची होती कारण मला फक्त थोडेच दिवस वेळ होता. 1975 च्या डिसेंबर महिन्यात डॉ. बर्जेस यांच्या बरोबर मी धाराशिव कॅम्पमध्ये मुक्काम केला होता. त्या स्थानापासून फक्त 12 मैलावर इतके सारे बघायला मिळेल याची मला मी आलो तेंव्हा कल्पनाही करता आली नसती."

         भारतीय पुरातत्त्व विभागाच्या रेकॉर्डमध्ये तेर गावाची नोंद एक ऐतिहासिक स्थान म्हणून झाल्यानंतर तेथे या विभागाने 1957-58; 1966-67 to 1968-69; 1974-75; 1987-88; 1988-89 या वर्षात उत्खनन मोहिमा केल्या. याशिवाय महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागाने येथे 1987-88 मधे उत्खनन केले.तगरचे पुरावशेष नदीच्या दोन्ही तीरांवर एकूण नऊ पांढरीच्या टेकाडांवर सांप्रत आढळतात. या टेकड्यांची नावे अशी १) साहोत्रे टेकडी २) तेली टेकडी ३) मुलानी टेकडी ४) महार  टेकडी ५) कोट  टेकडी ६) सुलेमान  टेकडी ७) कैकाडी  टेकडी ८) रेणुका  टेकडी ९) सुतार  टेकडी १०) बैरागी टेकडी. आज तेरला एकूण सात टेकड्या शिल्लक आहेत. म्हणजे, कोट, बैराग, कैकाडी, मुलानी, महार, रेणुका आणि चहुत्रे. या पैकी फक्त रेणुका, कोट व बैराग येथे उत्खनन झाले आहे, अन्य ठिकाणी नाही. 

तेर येथे आढळलेले जमीनीचे निरनिराळे थर

          १९०१ पासून येथील पुरावशेष तसेच प्राचीन वास्तू-मंदिरे संशोधकांना तसेच प्राचीन वस्तुसंग्राहकांना सतत आकर्षित करीत राहिल्याचे दिसून येते. हेन्री कझिन्स यांनी तेरणा नदीच्या दोन्ही तीरांवर आढळणाऱ्या विपुल पुरावशेषांची नोंद घेतली (१९०२-०३). त्यांनी येथील त्रिविक्रममंदिरासह इतर प्राचीन वास्तूंच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. हैदराबाद संस्थानच्या पुरातत्त्व खात्याने तेर येथील पुरावशेष जतन करण्याच्या दृष्टीने पाहणी केली होती (१९२९-३०), तर डग्लस बॅरेट (१९६०) यांनी तेर येथे सापडलेल्या काही महत्त्वपूर्ण कलात्मक वस्तू व मंदिरांचे वर्णन एका पुस्तिकेद्वारे प्रकाशित केले. या कलात्मक वस्तूंतून इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील तेरचे वैभव प्रतीत होते. यातील हस्तिदंताची १२ सेमी. उंच मनमोहक कोरीव स्त्रीमूर्ती विशेष लक्ष वेधून घेते. अशाच तऱ्हेच्या हस्तिदंती स्त्रीमूर्ती इटलीतील ज्वालामुखीत (इ. स. ७९) नष्ट झालेल्या पाँपेई या प्राचीन शहराच्या उत्खननात मिळालेल्या आहेत (१९३८). यावरून तेर हे एक कलाकेंद्र होते व त्याचा रोमन नगराशी व्यापारी संपर्क होता, हे सिद्ध झाले आहे.
         1957-58 मधल्या मोहिमेला फारसे यश लाभले नाही तसेच कोणत्याच वास्तू किंवा त्यांचे भग्नावशेष उत्खननात सापडले नाहीत. या जागेवर इ.स.पूर्व 400 ते इ.स. 400 या कालखंडात मानवी वस्ती होती हे मात्र सिद्ध करता आले. सापडलेल्या पुरातन वस्तुंमध्ये, बहुसंख्येने वर्तुळाकार असलेली पण भिन्न भिन्न आकारांची अशी एकेचाळीस तांब्याची नाणी, दगडी पाटे-वरवंटे, लोखंडातून बनवलेले दिवे, बाण व भाले यांची अग्रे, सुर्‍यांची पाती, अस्थींपासून बनवलेली अग्रे, मणी. भाजलेली माती- शिंपले, -काच आणि पाषाण यांपासून बनवलेली कंकणे, यांचा समावेश होता. अर्धवट जळालेले तांदूळ, गहू व डाळी यांचा येथे लागलेला शोध वैशिष्ट्यपूर्ण मानता यावा.
         तेर येथील पांढरीच्या टेकाडाचे उत्खनन प्रथम पुणे येथील डेक्कन कॉलेजचे बी. एन. चापेकर आणि के. डी. बॅनर्जी यांनी पी. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले (१९५८). त्यानंतर अनेक वेळा (१९६६-६७,  १९६७-६८, १९६८-६९, १९७४-७५, १९८७-८८, १९८८-८९ आणि २०१५) येथे निरनिराळ्या संस्थांनी, विद्यापीठांनी महाराष्ट्र शासनातर्फे उत्खनने केली. या उत्खननांमुळे तेरचा सांस्कृतिक इतिहास, मौर्यपूर्व कालखंडापासून ते मध्ययुगीन कालखंडापर्यंत, एकूण पांच खंडांमध्ये विभागता आला; मात्र तेरचा सुसंगत इतिहास मांडणे फारसे शक्य झाले नाही. चापेकर व बॅनर्जी यांनी केलेल्या उत्खननात सातवाहनकालीन वस्तीचा पुरावा उपलब्ध झाला. विटांनी बांधलेली घरे, सांडपाण्याची शोषणकुंडे, सातवाहन राजांची नाणी, पक्वमृदा आणि केओलिनच्या उत्कृष्ट बनावटीच्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा, रंगीबेरंगी दगडांचे आणि काचेचे मणी येथे सापडल्याने सातवाहनकालीन तेरच्या लोकजीवनाची कल्पना करता आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे मोरेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘महार’ नामक पांढरीच्या टेकाडावरील उत्खननात (१९६६-६७) तेरच्या पहिल्या वस्तीचा कालखंड इ. स. पू. सु. ४०० ते २०० म्हणजे मौर्यपूर्व ते मौर्यकाल असा ठरविता आला. हे उत्खनन स्तरनिबद्ध वस्तीचा शोध घेण्यासाठी केले गेले. याच विभागाने पुन्हा दोन वेळा उत्खनन केले (१९६७-६८; १९६८-६९). यांत घरांचे अवशेष सखोलपणे अभ्यासता आले. त्याचप्रमाणे येथील सांस्कृतिक क्रमही पुनश्च सिद्ध झाले. याव्यतिरिक्त प्राचीन बौद्ध स्तूपांचे अवशेष सापडले. या स्तूपांचा व्यास २६ मी. होता. त्यामुळे सातवाहन काळात तेर हे बौद्धधर्माचे मोठे केंद्र होते, असे सिद्ध झाले. उत्कृष्ट कोरीव काम असलेले स्तूपांच्या कठड्यांचे खांब व इतर शिल्पे तेथील वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहेत. याशिवाय सातवाहन काळातील नाणी, मृत्तिकामूर्ती, मृत्पात्रे, मणी आणि विशेषतः रोमन मृत्पात्रे व पुतळ्या उपलब्ध झाल्या आहेत.
         यानंतरच्या म्हणजे 1966-67 मधील मोहिमेला बर्‍यापैकी यश लाभले असे म्हणता येते. पुरातत्त्व विभागाच्या अहवालातील खालील नोंद मी उद्धृत करतो आहे.
   "जमिनीत खोलवर आणि आडव्या पातळीत असे दोन्ही प्रकारातील उत्खनन केले गेले. सातवाहन कालातील रहाण्याची किंवा जीवन-पद्धती, घरांचे आराखडे नीट समजावे म्हणून आडव्या पातळीवरील उत्खनन केले गेले. यात 26 मीटर व्यासाच्या आणि विटा वापरून बांधलेल्या एका मोठ्या स्तूपाच्या तळाचा शोध लागला. या स्तूपाचा आराखडा एका चक्रासारखा होता. या चक्राच्या मध्यभागी स्तूपाचा तळ होता व त्यापासून, वक्र रेषांनी जोडलेल्या (circular ribs) कोनाकृती आकारातील, आठ आरे बाहेर निघत होते. या कोनाकृतीमध्ये विटा जमिनीत बसवलेल्या होत्या. स्तूपाच्या चारी दिशांना विटांमध्ये बांधलेले चार आयका चौथरे (ayaka platforms) व त्यांना जोडणारा एक प्रदक्षिणा पथही सापडला. या स्तूपाच्या बांधकामाचा कालखंड तेथे सापडलेल्या शिलालेखामध्ये उल्लेख केलेली गवंड्यांची नावे व सातवाहन राजा पुलुमवी याची छबी असलेल्या नाण्याचा तेथे लागलेला शोध, यावरून इसवी सनानंतरच्या दुसर्‍या शतकामधील प्रथम अर्ध-शतकातील असला पाहिजे हे सिद्ध करता आले. याच कालखंडात, विटांमध्ये बांधले गेलेले आणि एक बाजू लंबवर्तुळाकार आकाराची असलेले एक मंदीर (apsidal brick temple) येथे सापडले. या मंदिराच्या आतील बाजूस सुद्धा एक स्तूप बांधलेला होता आणि मंदिरासमोर लाकडी मंडप होता. या मंदिराचा कालखंड सुद्धा गौतमीपुत्र सातकर्णी याचा मुलगा पुलुमवी याची छबी असलेल्या नाण्याच्या शोधामुळे नक्की करता आला. या मंदिराची 3 वेळा डागडुजी केल्याचेही आढळून आले. या शिवाय, भाजलेल्या मातीतून आणि चिनी मातीतून (kaolin) बनवलेल्या छोट्या मूर्ती, आभूषणे, केश-रचना उपकरणे, भाजलेल्या मातीतील दिवे, कंकणे, रोमन कागदपत्रांना लावण्याची सिले (bullae), सूर्यदेवाचे चित्र असलेली क भाजलेल्या मातीतील एक चकती, शिंपल्यामध्ये कोरलेला एक सिंह, रोमन काचेची बाटली (Mediterranean type) कार्नेलियन, अ‍ॅगेट, लापिज-लाझुलि आणि शिंपले (carnelian, agate, lapis lazuli and shell) यापासून बनवलेले निरनिराळ्या आकारातील मणी एवढ्या गोष्टी उत्खननात सापडल्या."
टेराकोटा पदक
हाताने वापरायची पिठाची रोमन चक्की
दगडी ठसा
   

    ही उत्खनन मोहीम याच्या पुढच्या वर्षी सुद्धा चालू राहिली होती. त्याचा अहवाल काय म्हणतो ते पाहूया.
      "या आधीच्या वर्षात केलेल्या उत्खननात चक्राकार आराखडा असलेला एक मोठा स्तूप सापडला होता. या शिवाय भारतीय बनावटीची नसलेली कार्नेलियन किंवा रक्तशिला सील्स, भाजलेल्या मातीमधून बनवलेली सील्स आणि विशेष प्रकारचे दिवे हे सापडले होते. या वर्षी कापडाला रंग देण्यासाठी म्हणून मुद्दाम बनवलेली मोठी पिंपे सापडल्याने येथून मोठ्या प्रमाणात कापडाचा निर्यात व्यापार चालत असावा असे म्हणता येते. आधीच्या वर्षातील आणखी एक मोठा शोध म्हणजे त्रिविक्रम मंदिराच्या जवळच सापडलेले आणि एक भिंत लंबवर्तुळाकार आकाराची असलेले मंदीर. विटांनी बांधलेल्या या मंदिरात एक स्तूप सापडला होता. या स्तूपाची कमीत कमी तीन वेळा तरी डागडुजी करून त्याला विटांचा चौथरा बांधून नवीन आधार दिल्याचे आढळून आले होते. राजा पुलमवी याचे नाणे सापडल्याने त्याच्या कालखंडाचा अंदाज बांधता आला. मंदिराच्या समोरील बाजूस केलेल्या उत्खननात, लाकडी खांबांच्या आधारावर उभारलेल्या एका मंडपाचे भग्नावशेष सापडले होते." ( या अहवालात जरी काही बाबींची पुनरावृत्ती झाली असली तरी थोडी जास्त महिती दिली असल्याने मी तो परत येथे उद्धृत केला आहे.)


Objects made of Conch-Shell



Objects made of Conch-Shell


Head of Teracota
         या पुढील उत्खनन मोहीम 1974-75 मध्ये खालील उद्देशासाठी हातात घेतली गेली होती. 1) या स्थानावरील संस्कृतींचा कालक्रम 2) भाजलेली माती व चिनी माती (kaolin) या पासून बनवलेल्या छोट्या मूर्तींचा काल 3) या स्थानावर सातवाहन पूर्व कालातील वसाहती असल्यास त्यांचे स्वरूप. या स्थानावर असलेल्या अनेक छोट्या टेकड्यांपैकी "लामतुरे" टेकडी या नावाने ओळखली जाणारी व प्राचीन वसाहतींमुळे 8 ते 9 मीटर ऊंची प्राप्त झालेली टेकडी या वर्षीच्या उत्खननासाठी निवडण्यात आली. या जमिनीवर लामतुरे कुटुंबाची मालकी आहे आहे व या टेकडीला, टेकडी क्रमांक 1 या नावाने अहवालात संबोधले आहे. या अहवालाप्रमाणे या टेकडीच्या स्थानावर होऊन गेलेल्या वसाहतींचा इ.स.पूर्व तिसरे शतक ते इ.स. पश्चात तिसरे शतक हा कालखंड 3 टप्प्यांमध्ये विभागता येतो.
        यापैकी पहिला टप्पा, या स्थानावर मानवी वसाहत प्रथम केली गेली तो काल आहे. या टप्प्याकडे निर्देश करतात ते येथे मिळालेले भाजलेल्या मातीतून बनवलेल्या काळ्या रंगाच्या आणि तकाकी दिलेल्या भांड्यांचे तुकडे. दुसर्‍या टप्प्यामध्ये या संपूर्ण वसाहती भोवती सागाच्या फळ्यांची लाकडी तटबंदी उभारलेली होती असे आढळून आले. या सागाच्या फळ्या एकमेकाला सागाच्या लाकडापासून बनवलेल्या पिनांनी जोडलेल्या होत्या. तिसरा टप्पा हा या वसाहतीच्या दृष्टीने सर्वात वैभव संपन्न होता असे दिसते. या टप्प्याबद्दल हा अहवाल म्हणतो.
        "येथे सापडलेल्या भाजलेल्या व चिनी मातीच्या छोट्या मूर्ती, मणी, कोरीव काम केलेल्या हस्तीदंताच्या वस्तू, काळ्या-लाल रंगाच्या भाजलेल्या मातीच्या भांड्यांचे तुकडे, सातकर्णी आणि नंतरच्या राजांची नाणी या सर्व गोष्टी या टप्प्यामधे आढळून आल्या. या शिवाय भाजलेल्या मातीची तकाकी असलेली भांडी, दोन्ही बाजूंना कान असलेल्या बारीक गळ्याच्या सुरया (amphorae), मोठ्या प्रमाणात मिळालेली भाजलेल्या मातीतून बनवलेली सील्स (terracotta bullae) या मिळालेल्या गोष्टींमुळे या कालात ही वसाहत वैभव संपन्न होती या म्हणण्याला पुष्टी मिळते. या कालात येथे बांधल्या गेलेल्या वास्तू भाजलेल्या विटांमधून बनवलेल्या होत्या. घरातील जमिनींवर चुन्याचा ( चुनखडी आणि वाळू यांचे पाण्यात कालवलेले मिश्रण) (hydraulic lime-mortar) थर देण्यात येत असे. घरांना कौलारू छपरे होती. घरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी घराजवळच भाजलेल्या मातीच्या आणि एकावर एक बसवलेल्या रिंगांच्या मोठ्या नळ्या, खड्डे खणून जमिनीत पुरलेल्या असत."



दारु तयार करण्यासाठी असलेले रोमन भांडे 



Heads of Terracota



Heads of Terracota



Roman Grinder
       या उत्खननातून असेही आढळून आले की इ.स. नंतरच्या तिसर्‍या शतकाच्या सुमारास ही वसाहत (लामतुरे टेकडी) काही कारणांमुळे उजाड झाली. अहवालाप्रमाणे, या कालानंतर परत कधीही येथे मानवी वसाहत झाल्याचा, कोणताही पुरावा या ठिकाणी केलेल्या खोदकामात मिळाला नाही.
तेर येथे पुढची उत्खनन मोहीम महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि संग्रहालये विभागाने 1987-88 मध्ये हातात घेतली. या वेळेस हे उत्खनन सर्व्हे नं. 142/2 या ठिकाणी असलेल्या एका भूखंडावर केले गेले. हा भूखंड तेरणा नदीच्या उत्तरेकडच्या तीरापासून सुमारे 250 मीटरवर होता. याच ठिकाणी उत्खनन हातात घेण्याचे कारण असे होते की काही कामासाठी खड्डा खणत असताना येथे भूपृष्ठाखाली, विटांनी बांधलेला एक पाणी साठवण्याचा तलाव होता असे अचानक रितीने निदर्शनास आले होते. उत्खनन केल्यावर असे आढळले की हा तलाव 12 मी X 12 मी X 3 मी या आकारमानाचा होता व त्याचे बांधकाम भाजलेल्या विटा आणि मड मॉर्टर ( चिखल, पांढरी माती आणि रेती यांचे मिश्रण) वापरून केलेले होते. तलावात उतरण्यासाठी दक्षिण आणि पूर्वेच्या बाजूस पायर्‍यांचे बांधकाम केलेले होते. तलावात पाणी घेण्यासाठी निरनिराळ्या पातळ्यांवर इन्लेट्सची व्यवस्था तलावाच्या भिंतींमधून केलेली होती व तलावाचा तळ विटांनी बांधून काढलेला होता. तलावाच्या उत्तरेला, विटांनी बांधलेली व एका बाजूची भिंत लंबवर्तुळाकार आकाराची असलेली, एक पूर्वाभिमुख वास्तू बांधलेली होती असे आढळले. तेरणा नदीच्या काठावर तेर वसलेले असल्याने पावसाळ्यात नदीला पूर आला की वाहणारे अतिरिक्त पाणी या तलावात साठवून ते वर्षभर वापरले जात होते असा निष्कर्ष यावरून काढता येतो.

    या तलावाच्या पूर्वेला काही लंबवर्तुळाकार आकाराचे खड्डे असल्याचे सापडले. हे खड्डे कोळसा व राख यांनी भरलेले होते. खड्ड्यांच्या बाजू लालसर रंगाच्या बनलेल्या होत्या. यापैकी एका खड्ड्यात घाव घातल्याच्या खुणा असलेली दोन हाडे आणि एक दगड मिळाला. उत्खनन केले गेले होते त्या चरात, चिखलाचे पेलेट्स आणि 'लज्जागौरीची' एक तुटलेली मूर्ती सापडली. (मस्तकविरहित स्त्री शरिराच्या मूर्तीला या नावाने अजूनही संबोधले जाते. ती प्रजननक्षमतेची देवता असल्याचे मानले जात असे.)
         पुरातत्त्व खात्याचे एक अधिकारी बी.एन.चाफेकर आपल्या 1959 मधील अहवालात म्हणतात.
         " उत्खननात सापडलेल्या छोट्या मूर्तींवरून (The figurines) तत्कालीन समाजाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीच्या अवस्थेची कल्पना आपल्याला उत्तम रितीने करता येते. काही स्त्री मूर्तींच्या केसात भांग मधोमध पाडलेला आढळतो. काही मूर्तींमध्ये केस डोक्याच्या मागील बाजूस एखाद्या पंख्याप्रमाणे पसरून बांधलेले दाखवलेले आढळतात..... ....नग्न आणि चेहर्‍यावरचे नाक-कान या सारखे अवयव न दाखवलेल्या सपाट चेहेर्‍यांच्या मूर्तींमध्ये अशा केश-रचना विशेष करून केलेल्या आढळतात. आणखी एका केश-रचनेत केसांना डोक्यापासून खाली येताना 3 ठिकाणी रिबन किंवा बॅन्ड्ने बांधून नंतर केस वर उचललेले असल्याचे दाखवलेले आढळते..... पुरुष व स्त्री हे दोन्ही आभूषणे वापरत होते..... नग्न स्त्री मूर्तींच्या अंगावर बहुतेक वेळा कोणतीच आभूषणे दाखवलेली नसतात. या वैशिष्ट्यांमुळे या मूर्ती कोणत्यातरी पंथाच्या उपासना मूर्ती असाव्या असा अंदाज बांधता येतो.
         पश्चिमेच्या बाजूस, एका चौरस आकाराच्या वास्तूचे भग्नावशेष उत्खननामध्ये आढळून आले. या भग्नावशेषावर पांढर्‍या रंगाच्या कोणत्यातरी पदार्थाची पुटे चढलेली होती. या वास्तूच्या आत, 55 x 55 x 70 सेमी. या आकारमानाचे एक कुंड आढळले. या कुंडात मोठ्या तोंडाच्या पसरट आकाराच्या मातीच्या भांड्यांचे (bowls) तळ सापडले. ही भांडी वस्त्रांना लाल रंग देतात त्या प्रकारची मध्यम गडद रंगछटा असलेली होती. सांडपाणी वाहून जावे म्हणून बनवलेले एक विटांचे गटारही वास्तुच्या पश्चिमेस असल्याचे आढळले. वास्तू व हे गटार यामधे मिळून बोल्स प्रकारच्या भांड्यांचे एकूण 352 तळ सापडले त्यापैकी 78 तळ या गटारात मिळाले. उत्तरेकडे खणलेल्या चरात 10-50 x 10-50 मीटर आकारमानाच्या एका वास्तूचे अवशेष मिळाले.
          या सर्व वर्णनावरून, आंध्र प्रदेशातील कोंडापूर येथे पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेल्या वास्तूंचे अवशेष व इतर वस्तू यांचे तेर उत्खननात सापडलेल्या गोष्टींशी कमालीचे साधर्म्य असल्याचे सहजपणे जाणवते. कोंडापूर मधे पुरातत्त्व विभागाला काय मिळाले होते ते पाहूया.
कोंडापुर उत्खनन स्थळ

"इ.सनाच्या प्रारंभ कालात दख्खनच्या पठारावर वास्तव्य करणार्‍या लोकांच्या धार्मिक परंपरा आणि रुढी, कोंडापूर येथे केल्या गेलेल्या उत्खननामुळे प्रकाशात येऊ शकल्या आहेत. जी. महेश्वरी, सुपरिटेंडिंग आर्किऑलॉजिस्ट यांच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यांच्या एका गटाने हे उत्खनन सुरू केलेले असून सुमारे 45 मजूर या कामावर भग्नावशेषांना धक्का न लागू देता खणण्याचे कार्य अत्यंत काळजीपूर्वक करत आहेत. येथे पश्चिमेस सापडलेल्या आणि विटांमध्ये बांधकाम केलेल्या वास्तूमुळे येथे वैदिक किंवा अग्नीपूजक पंथाच्या लोकांचे वास्तव्य होते हे स्पष्ट होते. ही वास्तू म्हणजे एक मोठा कॉम्लेक्स होता. यात एक दक्षिणाभिमुख वर्तुळाकार आकाराचे मंदीर होते. या मंदिराला एकच प्रवेशद्वार होते. या मध्यवर्ती मंदिराच्या चहुबाजूस आयताकृती आकारांचे कक्ष आणि त्याच्या मागे साधारण 3 मीटर खोलीची व 37 विटा वापरून बांधलेली यज्ञकुंडे होती. त्यांचे बांधकाम अनेक प्रकारच्या आकाराच्या भाजलेल्या विटांनी (त्रिकोणी, डमरू) केलेले होते. यज्ञकुंडात अग्नी पेटवला गेला असल्याच्या अनेक खुणा होत्या व त्रिशुळाचे चित्र रेखलेले 5 घट होते. या शिवाय या सर्व कॉम्प्लेक्स मध्ये पशुंच्या हाडांचे तुकडे (बहुधा बली दिलेल्या) व या बलीदान विधींसाठी वापरली जाणारी भाजलेल्या मातीची बोल्स, झार्‍या, किटल्या, लोखंडी सुरे आणि भाल्याची अग्रे या सारखी उपकरणे सापडली. यावरून राजे मंडळी येथे पुत्रकामेष्टी सारखे किंवा देवतांना प्रसन्न करण्यासाठीचे यज्ञ समारंभ करून पशूंचे बली देत असावेत असा निष्कर्ष काढता येतो. याशिवाय येथे चुनखडीच्या दगडातून बनवलेली, राजाला आलिंगन देत असणार्‍या व जानवे घातलेल्या राजगुरूची मूर्ती, रोमन सम्राट टायबेरियस याच्या प्रतिमेसारखी दिसणारी प्रतिमा उमटवलेली, चांदी व सुवर्ण लेप दिलेली नाणी व भाजलेल्या मातीची सील्स येथे सापडली. ब्राम्हण पुजार्‍यांच्या समाजातील स्थानाची यावरून चांगली कल्पना येते."
          यज्ञविधी करणे व त्या वेळी पशूंचे बली देणे या शिवाय सातवाहन कालातील समाज धार्मिक विधी म्हणून मूर्तिपूजा करत होता का? या प्रश्नाचे उत्तर कोंडापूर उत्खननातून स्पष्ट रितीने मिळते. वर वर्णन केलेल्या वर्तुळाकार मंदिराच्या परिसरात लज्जागौरीच्या ( प्रजननक्षमतेची देवता) अलंकार भूषित अनेक नग्न मूर्ती मिळाल्या. या बरोबरच लोखंडात बनवलेली काही पूजेची उपकरणेही सापडली. या शोधामुळे येथे लज्जागौरीची पूजा केली जात होती याचा स्पष्ट पुरावा मिळाला होता.
          थोड्या विषयांतराचा धोका पत्करूनही मी कोंडापूर उत्खननाबद्दलची ही माहिती येथे देण्याचे कारण, मला तेर आणि कोंडापूर येथे पुरातत्त्व विभागाला सापडलेल्या वास्तू आणि वस्तू यात किती साम्य आणि साधर्म्य आहे ही बाब ठळकपणे वाचकांना दर्शवून देणे आवश्यक वाटते. त्याचबरोबर हेही लक्षात येते की या दोन्ही ठिकाणचे समाज तशाच आणि त्याच धार्मिक परंपरा आणि रुढी पाळत होते. 1959 मध्ये लिहिलेल्या आपल्या अहवालात श्री. बी.एन.चाफेकर या बद्दल लिहितात:
          " तेर आणि कोंडापूर या दोन्ही जागांवर सापडलेल्या मूर्तींची शैली आणि तंत्र या मध्ये दिसणार्‍या कमालीच्या साम्यामुळे असे खात्रीपूर्वक म्हणता येते की या दोन्ही ठिकाणी भाजलेल्या मातीच्या वस्तू बनवण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत होते आणि या उद्योगांमध्ये सततची व्यापारी देवघेव आणि संबंध, ही दोन्ही ठिकाणे भौगोलिक दृष्टीने नजीक असल्याने, राखले जात होते. किंवा अशीही शक्यता वाटते की या दोन्ही ठिकाणी उत्पादन झालेल्या वस्तू एका निराळ्या व बाहेरच्या बाजारपेठेस निर्यात होत होत्या. "




    

  टेराकोटा खेळणी

  तेर येथील उत्खननाकडे परत वळूया. येथे मिळालेल्या इतर पुरातन वस्तुंमध्ये मौल्यवान खड्यांचे मणी, शिंपल्यामधून बनवलेली कंकणे, नक्षीकाम केलेले अस्थींचे तुकडे, हस्तीदंत तुकडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एका बाजूला उभ्या असलेल्या दासी, दुसर्‍या बाजूस लक्ष्मीची आकृती आणि मध्यभागी एक शाही जोडपे असे चित्र कोरलेला एक हस्तिदंती कंगवा येथे सापडला. शैलीवरून हे कोरीव काम इ.स. पहिल्या शतकातील असावे असे म्हणता येते.
         पुरातत्त्व विभागाच्या अहवालाप्रमाणे, तेर येथील उत्खननात सापडलेला, इ,स,पहिल्या शतकामधील आणि धार्मिक कार्यासाठी वापरला जाणारा कॉम्प्लेक्स आणि त्याच जागी तीर्थकुंड, यज्ञवेदी, यज्ञात वापरावयाची भांडी आणि लंबवर्तुळाकार आकाराची एक भिंत असलेली वास्तू हे सर्व सापडणे हे महत्त्वपूर्ण मानले पाहिजे. तसेच इतिहास पूर्व कालातील (protohistoric), अग्नी दिलेल्या शवाची रक्षा परत जमिनीत पुरणे (secondary burial), या सारख्या आधीच्या परंपरा आणि रुढी, ज्ञात इतिहासाच्या अगदी सुरवातीच्या कालात (early historical level,) आधीच्या कालाप्रमाणेच चालू राहिल्या होत्या ही गोष्ट सर्व प्रथम तेर उत्खननाच्या अहवालातून सांगितली गेली आहे.
         यानंतर 1988-89 मधील उत्खननाकडे वळूया. या ठिकाणी आधी 1986 मध्ये, सर्व्हे नम्बर 406/1 आणि 406/2 या ठिकाणची जमीन नांगरत असताना, शिलालेख कोरलेला एक स्तंभ मिळाला असल्याने, येथे उत्खनन सुरू केले गेले. ही जागा तेर गावाच्या नैऋत्येला सुमारे अडीच किमी वर असून तेरणा नदीच्या उत्तरेला 1875 मीटर अंतरावर नदीपात्रापासून सुमारे 20 मीटर उंचीवर आहे. येथे सापडलेल्या वास्तूचा अचूक आराखडा जरी सांगता येत नसला तरी ही वास्तू एक भिंत लंबवर्तुळाकार असलेली असावी. स्तंभ उभे करण्यासाठी म्हणून घेतलेले अंडाकृती आकाराचे काही खड्डे आढळून आले. चुनखडीच्या पाषाणामधे (limestone) कोरलेले पुरुषाचे एक 34 X 17 X 10 सेमी आकारमानाचे पूर्णरूप (full relief) शिल्प येथे सापडले. या शिल्पामधील पुरुष धोतर नेसलेला असून कंबरेला त्याने चौकोनांचे डिझाइन असलेला पट्टा बांधलेला आहे. त्याच्या गळ्यात एक सुवर्णहार असून कानात कर्णभूषणे आणि पगडीवजा सपाट शिरस्त्राण वापरलेले आहे. उजवा हात कंबरेवर ठेवलेला असून डावा हात कपाळाजवळ असलेल्या पगडीच्या टोकाला स्पर्श करतो आहे. पगडीच्या या टोकावर बहुधा हिरे भरतकाम करून बसवलेले आहेत. हे शिल्प एका 3 सेमी उंचीच्या चौथर्‍यावर उभे आहे. मात्र एकूण शिल्प ओबड-धोबड वाटते. याच प्रकारचे, चिनी मातीत व भाजलेल्या मातीत बनवलेले अनेक पुतळे या स्थानावर सापडले आहेत. 44 X 34 सेमी आयताकृती आकाराचा व 1.10 मीटर उंचीचा एक तुटलेला स्तंभ एका खड्यात गाडलेला सापडला. या स्तंभाच्या एका बाजूस अर्धे कमल पुष्प आणि जाळीचे डिझाइन ( हिनयान कालातील अगदी सर्वसामान्य कोरीवकाम) कोरलेले आहे. एक विटांनी बांधलेली चौरस वास्तू येथे सापडली मात्र या वास्तूचे प्रयोजन काय असावे हे समजू शकले नाही.


TERRACOTTAS - Image with Child


TERRACOTTAS - Godess Seated on Lotus Pedestal


TERRACOTTAS - Pratima Dip

Handle made of Conch

Female Image of Ivory
TERRACOTTAS (Male Figure)

तेर येथे विटांचे बांधकाम असलेल्या कुंडांचे अवशेष अनपेक्षित रीत्या उजेडात आले (१९८७). या कुंडांचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अरविंद जामखेडकर व के. डी. कावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनने केली (१९८७-८८, १९८८-१९८९). ही कुंडे सातवाहन काळातील (इ. स. पहिले शतक) असल्याचा निष्कर्ष उत्खनकांनी काढला आहे. या कुंडसंकुलात चापाकृती बांधकामाचे अवशेष, अग्निकुंडसदृश जागेचे अवशेष इ. निदर्शनास आले. या उत्खननात सातवाहनकालीन मृद्भांडी व इतर अवशेष तसेच कुंडांशी निगडित वस्तू तेरणा नदीच्या उत्तर किनाऱ्यापासून २५० मी. अंतरावर सापडल्या. तसेच एक अभिलेख असलेला स्तंभ व बांधकामांचे अवशेष हाती लागले. याशिवाय ३४ सेंमी उंची असलेले पुरुषाचे शिल्प तसेच कमळाचे नक्षीकाम असलेला स्तंभही सापडला. शिल्प व स्तंभ चुनखडीच्या दगडांवर कोरलेले आहेत.
‘तेर’ची मांडली थेरं; महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा असलेल्या प्राचीन स्थळाकडे अक्षम्य दुर्लक्ष
    महाराष्ट्र शासनातर्फे येथे जे उत्खनन करण्यात आले (२०१५). त्यात सातवाहन काळातील विविध वस्तू व वास्तूंव्यतिरिक्त प्राचीन तगर नगरीभोवती असणाऱ्या लाकडी तटबंदीचे अवशेष पुनश्च मिळाले.
तेर येथे उपलब्ध झालेल्या असंख्य वस्तू-वास्तूंतून इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील तेरचे वैभव आणि कलाप्रियता प्रतीत होते. सातवाहनांच्या नंतर तेरला थोडीशी अवकळा आली; तथापि राष्ट्रकूट-शिलाहार काळांतही हे शहर अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. त्यातील त्रिविक्रम मंदिराची बांधणी चैत्यासारखी आहे. त्याचा काळ इ. स. दुसरे ते पाचवे शतक या दरम्यानचा आहे. ही वास्तू महाराष्ट्रातील सर्वांत प्राचीन वास्तूंपैकी एक असल्याचे मानले जाते. याशिवाय उत्तरेश्वर आणि काळेश्वर ही राष्ट्रकूट काळातील मंदिरे महत्त्वपूर्ण आहेत. यातील उत्तरेश्वराच्या गर्भगृहाच्या दरवाजाची लाकडी चौकट उत्कृष्ट कोरीव कामाबद्दल व नक्षीदार विटांबद्दल प्रख्यात आहे. वेलबुट्ट्या, विविध प्राणी व मानवी आकृत्या यांनी ती अलंकृत केली आहे.      

    तेर येथील उत्खननात सापडलेल्या गोष्टींचे वर्णन एवढ्या बारकाईने मी वर केले आहे याचे कारण म्हणजे वाचकांना, रोम बरोबर चालू असलेल्या सातवाहन साम्राज्याच्या व्यापारामध्ये तेर गावाचे असलेले महत्त्व विशद व्हावे. तेर येथे पुरातत्त्व विभागाने बांधलेले एक संग्रहालय आहे त्यात थोड्या थोडक्या नाहीत तर तब्बल 23852 पुरातन वस्तू सांभाळून ठेवण्यात आलेल्या आहेत. या संग्रहालयाला भेट दिली असता तेर आणि रोम या मधील व्यापारी संबंधांची उत्तम कल्पना येऊ शकेल.
अलीकडच्या काळात झालेल्या उत्खननामध्ये तेरला अत्यंत बहुमूल्य अशा गोष्टी सापडल्या. आज घरोघरी खाल्ली जाणारी खिचडी ही तेरला 2200 वर्षापूर्वी बनवली जात होती हे ऐकून अनेकांना धक्का बसला. तसेच तेरला सापडलेल्या एका हस्तीदंताच्या बाहुलीसारखी दुसरी एक बाहुली इटलीमधल्या पोंपे येथे आहे.
या बाहुलीची नेमकी कथा समजावून घेउया. 1950 ते 60 च्या दरम्यान काही स्थानिक गावकऱ्यांना ही हस्तिदंती बाहुली सापडली. त्या गावकऱ्यांनी तेर गावातले एक हौशी संकलक रामलिंग अप्पा लामतुरे त्यांना साधारणपणे 12.50 सेंटीमीटरची ती बाहुली दिली.
      “ती बाहुली हस्तिदंताची आहे. तिच्या डोक्यावर एक छिद्र आहे. ते कदाचित आरसा लावण्यासाठी असावे. असा अंदाज आहे की, तिची निर्मिती साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात झाली असावी. विशेष म्हणजे, तशाच दोन बाहुल्या अन्य ठिकाणी सापडले आहेत. एक आहे ती रोमच्या पॉम्पी म्युझियममध्ये, तर दुसरी सापडली ती जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये (भोकरदनला सातवाहनांच्या काळात भोगवर्धन असे म्हणत. तेसुद्धा व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे होते). या तिन्ही बाहुल्या तशा दिसायला सारख्या आहेत, पण पॉम्पी व भोकरधन मधल्या भावल्यामध्ये हे साम्य काहीसे अधिक आहे.
काय आहेत या नव्या बाहुलीचे वैशिष्ट्ये?
       तेरमध्ये सापडलेल्या बाहुली बद्दल सांगायचं झालं तर तिचे डोळे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बाहुली मध्ये कुठलाही रंग वापरण्यात आला नसला तरीसुद्धा तिचे कोरलेले डोळे घारे दिसतात. तिने नऊवारी नेसली असून मागच्या बाजूला तिच्या काष्टाचा स्वकाच्च (साडीचा मागे खोचण्याचा भाग) आहे. तिने वर उत्तरिय परिधान केला आहे. गळ्यात माळा आहेत व केशरचनासुद्धा छान व काहीशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. वर उचललेल्या उजव्या हातात बांगड्या आहेत. तिच्या केसाची सेटिंग एखाद्या पंख्याप्रमाणे असून, खाली वेण्या सोडलेल्या आहेत. त्या बाहुलीच्या कपाळावर बिंदी आहे आणि गळ्यात लांब हार. पॉम्पी व भोकरदन इथल्या बाहुल्यांमध्ये काहीसा फरक असा की त्यांच्या पायाजवळ काही छोटी माणस आहेत. ते बहुदा त्यांचे सेवक असावेत व त्यांना मेकअपचे साहित्य देत असावेत,” असे पाटील यांनी सांगितले.
सध्या ही बाहुली आहे तरी कोणाकडे?
        तेरच्या रामलिंग अप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालयाचे क्युरेटर अमोल गोटे यांनी अशी माहिती दिली की, ही दुर्मिळ प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण बाहुली ही रामलिंग अप्पा लामतुरे यांचे नातू रेवप्पा लामतुरे यांच्या वैयक्तिक संग्रहातली आहे. या बाहुलीला तगर लक्ष्मी म्हणतात तर, पॉम्पीच्या बाहुलीला भारतीय लक्ष्मी. या बाहुल्या प्राचीन काळातल्या फार महत्त्वाचा वारसा आहेत. त्यांच्यावरची कलाकुसर ही फार बहुमूल्य आहे,
          तेर येथील संग्रहालयात ठेवलेल्या पुरातन वस्तूंपैकी अनेक, या गावात वाण्याचा व्यवसाय करत असलेले कै. रामलिंगप्पा लामतुरे यांनी संग्रहित केलेल्या आहेत. कै रामलिंगप्पा यांना गाव आणि परिसर यांच्या इतिहासाबद्दल प्रचंड कुतुहल होते, गावातील मुले पटांगणावर खेळत असताना जमीन खोदून बघत असत. असे करत असताना त्यांना मधून मधून अचानकपणे पुरातन वस्तू सापडत असत. अशा वस्तू लामतुरे संग्रहित करून त्यांची व्यवस्थितपणे राखण करत असत. लामतुरे यांच्या मदतीमुळेच पुरातत्त्व विभागाला तेर संग्रहालयाची स्थापना करता आली. रामलिंगप्पा यांनी आपला सर्व पुरातन वस्तूंचा संग्रह तर या संग्रहालयाला भेट दिलाच पण त्यांनी इतर गावकर्‍यांचेही मन वळवले व त्यांच्याकडील, ज्यांची किंमत सुद्धा करता करता येणार नाही अशा पुरातन वस्तू आणि नाणी संग्रहालयाला भेट देण्यास भाग पाडले. या संग्रहालयाला कै. लामतुरे यांचेच नाव देण्यात आलेले आहे. संग्रहालयातील संग्रहाच्या व्यतिरिक्त, रामलिंगप्पा यांचे नातू श्री रेवणसिद्ध लामतुरे यांचेकडे त्यांचा वैयक्तिक संग्रह अजूनही आहे.
प्रजननक्षमतेची देवी किंवा माता देवी  

       तेर येथे सापडलेल्या प्राचीन वास्तू आणि वस्तू यावरून हे स्पष्ट होते की येथील गावकर्‍यांमध्ये बौद्ध व वैदिक अशा दोन्ही धर्मांचे अनुयायी होते आणि या शिवाय प्रजननक्षमतेची देवी किंवा माता देवीची आराधना सुद्धा केली जात होती. तेर आणि कोंडापूर येथे सापडलेल्या मूर्तींमध्ये कमालीचे साम्य दिसून येते व यावरून या दोन्ही स्थानांमध्ये उत्तम दळणवळण सतत चालू होते असे म्हणणे योग्य ठरावे.
      वर वर्णन केलेल्या उत्खननाला 40 वर्षे लोटल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने परत एकदा तेर यथे उत्खनन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक असलेला भारतीय पुरातत्त्व विभागाचा परवाना त्यांना जानेवारी 2015 मध्ये प्राप्त झालेला आहे. तेर येथील चार जागा उत्खननासाठी निश्चित केल्या गेल्या आहेत व कार्य लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. वाचकांना आतापर्यंत कल्पना आली असेलच की सातवाहन काल आणि दख्खनच्या पठाराच्या इतिहासाच्या आकलनाच्या दृष्टीने तेर येथील उत्खननांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुढील पिढ्यांसाठी तेर येथील पुरातन वास्तू, भग्नावशेष आणि उत्खनन होणार्‍या जागांचे संरक्षण करणे हे यामुळेच अनिवार्य व अत्यंत महत्त्वाचे आहे .तेरला प्राचीन काळात लाकडाची तटबंदी होती असेही लक्षात आले आहे. तेरच्या प्रत्येक कोपऱ्यात अशा इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. कधी कुणाच्या अंगणात एखादी प्राचीन वस्तू सापडते तर कधी शेतात. 2000 च्या आसपास एका शेतकऱ्याला तर आपल्या जमिनीत एक कुंड सापडला!
      या प्राचीन वारशाची अवस्था अक्षरश: ‘नाही चिरा नाही पणती’ म्हणावी अशी आहे. तेरला दहा टेकड्या होत्या, ज्यांच्या खाली उत्खनन केल्यावर बरेच पुरातत्वीय अवशेष सापडले असते. दुर्देवाने यातल्या तीन टेकड्या या उध्वस्त झाल्या आहेत. कारण, अनेक मंडळींनी ही माती काढून त्याची बांधकाम व वीटभट्टी यांसाठी विक्री केली किंवा त्याचा खत म्हणून वापर केला. तेरमध्ये उत्खनन केलेल्या एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाच्या मते ह्यामुळे अनेक अनमोल असे ऐवज, उदाहरणार्थ भांडी, दागिने, खेळणी व बाहुल्या एक तर नष्ट झाले असतील किंवा त्यांची विक्री झाली असेल. समाज या महत्त्वाच्या ऐवजला कदाचित कायमस्वरूपी मुकला असेल हे वेगळे सांगायला नको…
 बौध्द धर्म आणि तेर :-
  बौध्द धर्म आणि तेरचा संबध अगदी पहिल्यापासून आला असावा अशी शक्यता आहे. बौध्द धर्माची स्थापना झाल्यावर पहिला पंथ होता तो थेरवादी ज्यांना पुढे हीनयान म्हणले गेले. याच थेरवादी पंथावरुन पुढे तेर नाव पडले असावे. सातवाहन काळात तेरचे महत्व अतिशय वाढले असावे. तेरचा संबध आंध्र प्रदेशातील अमरावती, नागार्जुन तांडा आदी नगराशी प्रस्थापित झाल्याचे तेरमधील बौध्द अवशेषावरुन स्पष्ट झाल्याचे संशोधक सांगतात.
 र्हाईस डेव्हीस यांनी आपल्या 'बुध्दीस्त इंडीया' ग्रंथात तेर येथील बुध्द धर्माचा संदर्भ थेट बुध्द काळापर्यंत म्हणजे इ.स.पुर्व ५ ते ६ व्या शतकापर्यंत जाउ शकतो असे नमुद केले आहे. अनेक जातककथांमध्ये तगरशिखीन नावाच्या आचार्यांचा उल्लेख असून त्यातील तगर हे नगराचे नाव तर शिखीन हे व्यक्तीचे नाव असावे. नांदेड-बोधन परिसरात गोदावरी काठी असलेल्या आश्रमात बौध्द धर्माचा प्रभाव होता. सहाजिकच अश्मक राजाच्या परिसरात असणार्या तगर परिसरात असणार्या शिखीन या आचार्यांना संघात महत्वाचे स्थान असणार. म्हणजेच दक्षीण भारतात बौध्द धर्माचा प्रभाव आणि प्रसार होत असताना बौध्द धर्मीयांची आणि व्यापार्यांची ये जा होत अस्णार. सहाजिकच इथे अनेक स्तुप आणि चैत्यगृहे बांधली गेली असावीत. स.न. १९६८ च्या उत्खननात पक्क्या वीटांनी बांधलेल्या द्विचक्राकार स्तुपाचे अवशेष सापडले आहेत.या स्तुपाचा बाह्य व्यास २६ मीटर , बाह्यचक्रास १६ आरे तर अंतरचक्रास ८ आरे होते. नाभिस्थानात चौरसाकृती ३४ स्तरांची वास्तु असलेला हा स्तुप वीटांमध्ये बांधलेला एक महत्वाचा वास्तुविशेष होता. 
 तेर आणि जैन धर्म :-
   तेरचा आणि जैन धर्माचा संबंध हि प्राचीन काळापर्यंत जाउ शकतो. तेर हे जैन धर्माचे अग्रगण्य पीठ होते. याचा इतिहास इ.स.पुर्व पहिल्या शतकामागचा असु शकतो. दक्षिणापथ म्हणजे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात जैन धर्माचा प्रसार करण्याचे कार्य केले ते चंद्रगुप्त मौर्य आणि जैन मुनी भद्रबाहु यांनी. इ.स. पुर्व चौथ्या शतकात भद्रबाहु यांचे कर्नाटकातील श्रवणबेळगोळ नजीकच्या चंद्रगिरी येथे आगमन झाले. तेर हे उत्तर भारत आणि दक्षिण भारत जोडणार्या मार्गावर असल्यामुळे इथे जैन धर्माचे संपर्क केण्द्र असावे. जैन मुनी कनकामर लिखीत करकण्डचरियु या दहाव्या ते अकराव्या शतकात लिहील्या गेलेल्या ग्रंथामध्ये तेरापुर येथील विद्याधर राजांनी जैन मंदीर निर्माण केले असे नमुद आहे. याच कालावधीत लिहीलेल्या ब्रम्हकथाकोषातही हिच माहिती विद्याधर राजांच्या उल्लेखासह आढळून येते. 
 तेरमध्ये असलेका शैव आणि वैष्णवांचा प्रभाव :-
  तेर येथे शैव पंथाचा प्रभाव खुप आधीपासून असल्याचे सुचित होते, ते या ठिकाणी असलेल्या शिवालयांमुळे. तेरमधील कालेश्वर, उत्तरेश्वर, सिध्देश्वर हि मंदिरे इथे असलेल्या  शैव पंथींचे अस्तित्व दर्शवतात.
  तर तेरमधील त्रिविक्रम मंदीर आणि नृसिंह मंदीर इथे असलेला वैष्णव पंथाचा प्रभाव दर्शवतात. इथे शैव उपासना इसवी सनाच्या सुरवातीपासून असावी असे वाटते. याचा पुरावा म्हणजे तेरमध्ये सापडलेला व्राम्ही भाषेतील आणि अलिकडे सापडलेला प्राकृत भाषेतील शिलालेख. हा दानलेख असून दिलेले दान शिवाला स्मरुन आहे असे लिहीले आहे. 
   त्याचप्रमाणे कर्नाटकात असलेया वीरशैव अर्थात लिंगायत पंथाचाही इथे वावर होता. या लिंगायत धर्माची स्थापना ज्यांनी केली ते बसवेश्वर कलचुरी घराण्यातील बिज्जलच्या सेवेत होते. याच बिज्जलाने पुढे कल्याणीच्या चालुक्यांना हरवून सत्ता प्रस्थापित केली.या बिज्जलाचे आजोबा जोगम कलचुरी यांच्याप्रमाणेच बिज्जल देखील कर्नाटकमधील काही शिलालेखात आपला उल्लेख तरिकाडु बिज्जल असा करतो. यातील तरीकाडू हे तेरचे कन्नड नामकरण असावे असे विद्वान मानतात. यावरुन बिज्जलाचा तेरशी संबध आला असावा, तसेच कर्नाटकातील एका शिलालेखात बिज्जलाने सन ११६२ मध्ये हल्ला चढवून तगरटेवर हल्ला चढवून ते जिंकल्याची माहिती आहे. बिज्जलाने याच वर्षी कल्याणीवर हल्ला करुन ते शहर आपल्या ताब्यात घेतले होते.यावरुन तगरटे म्हणजे तेर असावे व त्याचा संनंध कल्याणीच्या स्वारीशी होता, हे स्पष्ट होते.  
 आता तेर परिसराची प्रत्यक्ष भटकंती करुया.
    तेरचा सविस्तर इतिहास समजावून घेतल्यावर आता तेर परिसराची भटकंती करुया.  तेर गावात शिरल्यावर प्रथम लागते ते रामिलगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय. आपल्या गावात परदेशी प्रवासी येतात आणि इथल्या जुन्या वस्तू घेऊन जातात हे पाहून लहान रामिलगप्पाचे कुतूहल जागे झाले. त्याने याबद्दल मुख्याध्यापकांना विचारल्यावर त्यांनी तेर गावच्या इतिहासाबद्दल आणि इथे मिळणाऱ्या वस्तूंच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल रामिलगप्पाला माहिती सांगितली. त्यानंतर रामिलगप्पांनी अशा वस्तू जमवायला सुरुवात केली. हळूहळू गावकऱ्यांनीही आपल्याला सापडलेल्या वस्तू त्यांना आणून द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे रामिलगप्पांचा संग्रह वाढत गेला. आयुष्यभर जमवलेला संग्रह त्यांनी १९७२ मध्ये शासनाच्या हवाली केला. तोच २२,८९२ वस्तूंचा संग्रह आपल्याला रामिलगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयात पाहायला मिळतो. यामध्ये सातवाहन, चालुक्यकालीन नाणी, मातीची भांडी, दगडात, मातीत बनलेल्या मूर्ती, प्राणिप्रतिमा, पदक, दगडात कोरलेले शिलालेख, गद्धेगाळ, नक्षीकाम, शंखाच्या बांगडय़ा, वस्तू, हस्तीदंती वस्तू, पाण्यावर तरंगणारी वीट इत्यादी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या संग्रहालयातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहाव्या-सातव्या शतकातील उत्तरेश्वर मंदिराची लाकडी चौकट. मंदिराच्या गर्भगृहाची ही चौकट चिखलात पडून राहिल्याने इतक्या वर्षांनंतरही तशीच्या तशी होती. पुरातत्त्व खात्याने त्यावर काम करून ती संग्रहालयात ठेवलेली आहे. त्यावरील मूर्ती, नक्षीकाम, कोरीव काम पाहण्यासारखे आहे.
    वस्तुसंग्रहालय पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण गोरोबाकाकांच्या मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणी वारकरी आणि भक्तांचा मोठय़ा प्रमाणात वावर असतो. बाजूला चालुक्य काळातले काळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दोन सुंदर वीरगळ पाहायला मिळतात. मंदिराचा कळस आणि गर्भगृह ढासळलेले आहे. त्याची पुनर्बाधणी करण्याची आवश्यकता आहे. मंदिर परिसरात अनेक िपडी, सतीशिळा आणि समाधी पाहायला मिळतात.तेरणा नदी ओलांडून गेल्यावर आपण दाट वस्तीत असलेल्या उत्तरेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. ६-७ व्या शतकात कलचुरी राजवटीत संपूर्णपणे विटांमध्ये बांधलेले हे एकमेव मंदिर आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. मंदिराच्या बांधकामात शोभा आणण्यासाठी विविध प्रकारचे नक्षीकाम, मकरशिल्प असलेल्या विटा खास बनवून वापरलेल्या आहेत. मंदिराबाहेर काही वीरगळ पाहायला मिळतात. उत्तरेश्वर मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर चत्यगृहासारखे गजपृष्ठाकार रचना असलेले त्रिविक्रमाचे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिरही पूर्ण विटांनी बांधलेले असून मंदिरात श्रीविष्णूची त्रिविक्रम मूर्ती आहे. मंदिरासमोर असलेल्या मंडपात गरुडाची मूर्ती आहे.
तेरणा नदीच्या काठावर वसलेले तेर 

कसे जाल?
   रस्त्यामार्गे किंवा रेल्वेने जाता येईल. धाराशीवहून २५ किमी आणि तुळजापूरहून ५० किमी अंतरावर तेर गाव आहे. गावात खाण्यापिण्याचीही उत्तम सोय आहे.

 
 
 
 
 
 
प्राचीन स्तुप :-
   हलक्या आणि टिकाऊ विटांचं तंत्र त्याकाळी विकसित असावं. अशाच विटांचा एक बौद्धकालीन स्तूप 'तेर' एस टी स्टँडच्या समोरच केलेल्या उत्खननात नजीकच्या काळात सापडला आहे. मातीत मोठ्या प्रमाणात तूस मिसळून त्याची वीट उच्च तापमानाला भाजल्यास आतील तूस जळून जातं आणि सच्छिद्र पोकळ्या तयार झालेली वीट वजनानं खूप हलकी व मजबूत होते. या विटांची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यानं त्या पाण्यावर सहज तरंगतात.अशी पाण्यावर तरंगणारी वीट तिथल्या कै. रामलिंगप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालयात असून, अशाच विटेचा एक तुकडा गोरोबा काकांच्या मंदिरासमोर पाण्यावर तरंगताना दिसतो. महाराष्ट्रात मराठवाडा हे १५२४ पासून भूकंप प्रवण केंद्र असल्याच्या नोंदी आहेतच. प्राचीनकाळी जीवितहानी टाळण्यासाठी अशा हलक्या विटांची घरं आणि मंदिरं बांधण्याचं तंत्र तिथं विकसित झालं असावं. 




पूर्वमध्ययुगीन तेर

गणेश प्रतिमा, काळेश्वर मंदिर, तेर


इंडो-रोमन व्यापाराला उतरती कळा लागल्यानंतर अनेक व्यापारिक केंद्रे ओसाड पडू लागली, परंतु ती पूर्णपणे लयास गेलेली नव्हती. सातवाहन काळातील मराठवाडयातील तेर हे एक असेच ठिकाण, जेथे सांस्कृतिकव्यापारिक व राजकीय घडामोडी नंतरच्या काळातही अव्याहतपणे सुरु होत्या. साधारणतः सहाव्या शतकापासून ते बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत तेर परिसरात या घडामोडीविषयींचे अनेक पुरावे उपलब्ध पुरावशेषांतून दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने मंदिरे, शिल्पे, शिलालेख, वीरगळ इ. पुरावशेषांचा समावेश करता येवू शकतो. इ. सनाच्या चौथ्या शतकापासून पुढे सुमारे २०० वर्षे स्थानिक पातळीवर व्यापार सुरु असला पाहिजे. कारण याची परिणती म्हणून या भागात सुमारे सहाव्या शतकाच्या सुरुवातीला धाराशिव येथील जैन व चांभार लेणी खोदण्यात आलेली दिसतात. तेर येथील उत्खननात चौथ्या व पाचव्या कालखंडातील थर सु. वाकाटाक-चालुक्य ते पुढे मध्ययुगापर्यंतच्या काळाचा निदर्शक आहे. यावरून हे स्पष्ट होते की या कालखंडात येथे समृद्ध मानवी वस्ती अस्तित्त्वात होती.

तेर गावाच्या मधोमध स्थित त्रिविक्रम मंदिराविषयी अनेक विद्वानांनी आपापली मते मांडलेली आहेत. शां. भा. देव यांच्या मते ही वास्तू मुळात बौद्ध चैत्यगृहाची असून मागाहून येथे त्रिविक्रमाची मूर्ती स्थापित करून सभामंडप वगैरे बांधण्यात आले असावेत. या वास्तूच्या गर्भगृहाचा पृष्ठभाग अर्धवर्तुळाकृती असून त्यावरील छप्पर गजपृष्ठाकृती आकाराचे आहे. डॉ. माटे यांच्या मते अशा प्रकारची वास्तू पल्लव शैलीशी मिळती-जुळती असून ती हिंदू आहे. त्रिविक्रम मंदिरातील त्रिविक्रमाची मूर्ती खूपच आकर्षक असून मूर्तिकलेतील एक उत्तम उदाहरण आहे.

त्रिविक्रम मंदिर, तेर

तेर येथील उत्तरेश्वराचे मंदिर द्राविडी शैलीतील असून पूर्णपणे विटांचे आहे. शां. भा. देव यांच्या मते हे मंदिर सातव्या शतकातील असावे. या मंदिराची चौकट लाकडी असून कित्येक वर्षांनंतर आजही टिकून आहे. चौकटीच्या ललाटबिंबावर देव-देवतांची सुंदर शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की याच्या बांधणीत साच्यात बनविलेल्या अलंकृत विटांचा वापर केलेला आहे. 

उत्तरेश्वर मंदिर, तेर
उत्तरेश्वर मंदिरावरील कोरीव काम, तेर

संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिराशेजारील काळेश्वर मंदिर, चालुक्य काळातले मानले जाते. हे मंदिर विटांनी निर्मित असून काळ आणि शैली उत्तरेश्वर मंदिराशी मिळती-जुळती आहे.

काळेश्वर मंदिर परिसर, तेर

या शिवाय तेर येथे सिद्धेश्वर, नृसिंह मंदिर, त्रिपुरांतकेश्वर, अमरेश्वर, रामेश्वर, निलकंठेश्वर मंदिर इ. मंदिरे आहेत. सिद्धेश्वराचे मंदिर त्याच्या शैलीवरून यादवकालीन म्हणजेच १३व्या शतकातील वाटते. सध्या या मंदिराचा सभामंडप, गर्भगृह व स्तंभ अस्तित्त्वात आहेत. स्तंभशिर्षांवरील कोरलेले भारवाहक आकर्षक आहेत. नृसिंहाचे मंदिर गावाबाहेर असून त्याची बरीच पडझड झालेली आहे. तेरणा नदी पत्रात दगडांचा वापर करून बांधलेले त्रिपुरांतकेश्वर मंदिर होते. अमरेश्वराचे मूळ मंदिर सध्या अस्तित्त्वात नसले तरी सध्या अस्तित्त्वात असलेले  प्राचीन शिवलिंग मूळ ठिकाणी दिसते. याशिवाय काळेश्वर मंदिर परिसरात अनेक लहान-मोठी तुलनेने जुनी शिवलिंगे आढळून येतात. ही सर्व शिवलिंगे कधीकाळी तेर परिसरात अस्तित्त्वात असलेल्या मंदिरांची आठवण करून देतात.

सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप, तेर

तेर येथील व्यक्तींना पूर्वमध्यकाळात किती महत्त्व प्राप्त होते, हे इ. स. ६१२ सालातील पश्चिमी चालुक्यांच्या एका अभिलेखावरून स्पष्ट होते. या शिलालेखात तेर येथील ‘जेष्ठशर्मन’ या प्रसिद्ध व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे. राष्ट्रकुटांच्या इ. स. ६९३ च्या एका ताम्रपटातही तगरनिवासी ‘हरगण द्विवेदी’ यांना जमिनी दान दिल्याचा उल्लेख आहे. तेर येथील अकराव्या ते सोळाव्या शतकापर्यंतचे चार लेख ग. ह. खरे यांनी संपादित केले आहेत. यातील अकराव्या शतकातील कानडी भाषेतील शिलालेख त्रिविक्रम मंदिरात आहे. यात कलचुरी घराण्यातील महामंडलेश्वर ‘जोगमरस’ तसेच ‘वारीमल्लोज’ या शिल्पीचा उल्लेख आलेला आहे. बाराव्या शतकातील मराठी शिलालेख मारुतीच्या देवळाच्या पाराजवळचा असून यात उद्यापनाच्या निमित्ताने दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. जिन बसदी येथे पार्श्वनाथाच्या सिंहासनावर चौदाव्या शतकातील शिलालेखात वार्धमानाच्या देवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा तसेच पादुकादानाचा उल्लेख आहे.   

याशिवायतेर येथून पूर्वमध्ययुगीन कालखंडातील भरपूर मूर्ती-शिल्पे मिळालेली आहेत. यामध्ये विष्णू-नारायण, कार्तिकेय, भैरव व इतर देवी-देवतांची शिल्पे महत्त्वपूर्ण आहेत. तेर येथून प्राप्त झालेली बहुतेक शिल्पे येथील श्री. रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. या संग्रहालयात तसेच काळेश्वर मंदिरात काही वीरगळ दिसून येतात. काळेश्वर मंदिरातील वीरगळांचा कालखंड प्राचीन असून त्यांच्या शैलीवरून ती यादवकाळाच्याही पूर्वीची वाटतात.

रगळ, तेर

   शिलाहार राजे आपले मूळ तेरचे असल्याचे त्यांच्या शिलालेखात सांगतात. ते त्यांच्या नावासमोर  ‘तगर’ नावाशी संबंधित असलेल्या बिरुदावल्या लावीत. इ. स. ९९७ च्या शिलाहार घराण्यातील अपराजिताच्या शिलालेखात ‘तगरपुरपरमेश्वर’ असे बिरूद त्याने स्वतःला लावून घेतलेले आहे. इ. स. १०५८ मधील आणखी एका शिलालेखात शिलाहार घराण्यातील कराड शाखेच्या मारसिंहाने स्वतःला ‘तगरपुरवराधीश्वर’ हे बिरूद लावलेले आहे. याच लेखात या राजघराण्यातील ‘जतिंग’ या दुसऱ्या राजाचा उल्लेख ‘तगरनगरभूपालक’ असा केलेला आहे. ह्या भूभागावर शिलाहारांचा प्रत्यक्ष अंमल कधीच नसल्यामुळे ‘तगर’ हे फक्त त्यांचे मूळचे गाव असावे, असे दिसते. आजही उस्मानाबादजवळील पळसवाडी गावात ‘शेलार’ आडनाव असणारी कुटुंबे राहतात.  
    धाराशिव आणि तेरचा निकटचा संबंध असावा असे कर्कंडचरिउ व बृहत्कथाकोश या दोन ग्रंथांमधील उल्लेखांवरून समजते. बृहत्कथाकोशात धाराशिव येथील जिन मंदिरातील मूर्तीचा उल्लेख आलेला आहे. ‘तेरापूर’ या गावाच्या दक्षिणेस धाराशिवच्या जंगलात या मूर्ती सापडल्याची माहिती यात दिली आहे. या ग्रंथाचा नायक ‘कर्कंड’ हा तेरापुर येथील एका व्यापाऱ्याचा मुलगा होता, असे सांगितले आहे. यावरून तेर येथील व्यापार अगदी दहाव्या शतकापर्यंत अस्तित्त्वात असावा असे दिसते. अकराव्या शतकातील कर्कंडचरिउ या ग्रंथातही अशा आशयाची माहिती दिलेली आहे.
   तेराव्या शतकातील संतकवी गोरा कुंभार यांचे समाधिस्थळ तेरणा नदीकाठी असलेल्या काळेश्वर मंदिराजवळ आहे. संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायात जेष्ठ संत समजले जात. यामुळे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेही तेरचे महत्त्व अधोरेखित होते.
    बाराव्या-तेराव्या शतकात तेर येथे एक जैन देवालय (बसदी) बांधण्यात आले, ते वर्धमान महाविराचे असून त्याचा जीर्णोद्धार शके १३१३ मध्ये केला, असे येथील एका शिलालेखावरून दिसून येते. तसेच कर्कंडचरिउ व बृहत्कथाकोश या ग्रंथांतील आशयावरून १०व्या शतकापुर्वीच जैन मत तेरमध्ये प्रभावी होते, असे दिसून येते.

जैन मंदिरातील जैन प्रतिमा, तेर

एकंदरीत, पूर्वमध्ययुगीन काळातही तेरच्या विकासाची घौडदौड सुरूच होती. येथील व्यक्तींना तसेच शिल्पींना इतरत्र मान-सन्मान मिळत होता. शिलाहार घराण्यातील राजे तेर निवासी असल्याचा स्वतःचा उल्लेख अभिमानाने करीत असत. सातवाहन काळानंतर बौद्ध धर्माचा प्रभाव ओसरल्यावर हे एक वैष्णव केंद्र म्हणून पुढे आल्याचे येथील पुरावशेषांवरून दिसून येते. पुढे तेराव्या शतकात तेरचा संबंध वारकरी संप्रदायाशी आल्याचा आपणास दिसून येतो. 
संत गोरा कुंभार मंदिराच्या भिंतीत लावलेली विष्णू प्रतिमा, तेर

    जैन मताचा प्रभाव येथे संभवतः प्राचीन काळापासूनच असला पाहिजे, परंतु या संबंधीचे स्पष्ट पुरावे १०व्या शतकापासून काही ग्रंथांमधून मिळतात. पूर्वमध्ययुगात तेरची ओळख सातवाहन काळाइतकी मोठी नसली तरी, ती क्षेत्रीय पातळीवर अजूनही अबाधित राहिलेली दिसून येते.
   सु. सातशे वर्षांच्या या कालखंडात बऱ्याच राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक घडामोडी येथे घडून आल्याचे निदर्शनास येते. पूर्वमध्ययुगात राष्ट्रकूटांच्या राजधान्या ‘लत्तालूर’ (लातूर) व ‘मान्यखेट’, कलचुरींची राजधानी ‘मंगळवेढा’, चालुक्यांची राजधानी ‘कल्याणी’, यादवांची राजधानी ‘देवगिरी’, ‘अंबाजोगाई’ व तेरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, तेर आणि या राजवंशांचा घनिष्ट संबंध आलेला असावा. तेर परिसरातील सुपीक जमीन, तेरणेचे मुबलक पाणी, समृद्ध व्यापारी परंपरा, येथील समृद्ध घराणी व व्यापारी यामुळे तेर कित्येक वर्षे आर्थिकदृष्ट्या समृद्ध असे ठिकाण म्हणून नावलौकिक मिळवून राहिले असावे. धाराशिव व खरोसा येथील लेणी खोदण्यामागील प्रेरणेत तेरच्या परंपरागत वैभवाचा अप्रत्यक्ष प्रभाव असायला पाहिजे. खऱ्या अर्थाने तेरमुळेच दक्षिण मराठवाडयातील या प्रदेशाला प्राचीन व पूर्वमध्ययुगात खरी ओळख प्राप्त झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  

 तिर्थ बुद्रुक : सातवाहनकालीन बौद्ध केंद्र :-

 आजपासून जवळजवळ १८०० पूर्वी सध्याच्या महाराष्ट्रासह दक्षिण भारताच्या अनेक भाग सातवाहनांचा अधिकार कक्षेत होते. सातवाहनांचा व्यापार युरोपमधील रोमन साम्राज्याशी होत होता. रोमन साम्राज्यातून विविध प्रकारचे सामान भारतीय भुमीच्या पश्चिम सागरी किनार्यावर असलेल्या बंदरांमध्ये जहाजांद्वारे येत होते. या बंदरातून  भारताच्या आतील भुप्रदेशत असलेल्या व्यापारी पेठेतून सामान रोमन साम्राज्याकडे निर्यात होत होते. भारताचा जागतिक व्यापारात मोठा वाटा होता मसाले, मणि, सूती कपडे तसेच अन्य जीवनावश्यक साहित्याची आयात-निर्यात व्यापाराच्या माध्यमातून होत होती. हा व्यापार सातवाहनकाळात सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचला होता. या आयात-निर्यातीच्या व्यापारामुळे भड़ोच, शुर्पारक (नाला सोपारा), कल्याण, चौल, ब्रह्मपुरी, भोकरधन, अरिकामेडू या व्यापारिक केंद्रे आणि शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. 
तेर येथे सापडलेल्या मातीच्या मुर्ती ( टेराकोटा )

        यामुळे सातवाहनकालीन नागरीकांच्या जीवनात समाज, संस्कृती, धर्म, व्यापार, शिल्पकला आणि संपत्तीचा विकास झाला. या काळात बौद्ध धर्माचे प्रभाव या प्रदेशात वाढत गेला. सहाजिकच बौद्ध  धर्माशी संबंधित स्तूप, विहार, मठ आदि वास्तुचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.
या काळात महाराष्ट्राचे नाव दक्षिणापथ होते. सातवाहनकाळातील प्रचलित व्यापारी मार्ग म्हणजे सध्याच्या गुजरातमधील भडोचमधून सध्याच्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पैठण आणि पुढे तेरकडे जाणारा व्यापारी मार्ग.
   तेरमध्ये सातवाहन आणि रोम साम्राज्याशी संबधीत अवशेष सापडले आहेत. यामध्ये नाणी, भांडी, हस्तिदंती बाहुल्या, विवीध प्रकारचे रोमन दिवे या वस्तु सापडल्या. तेरमध्ये सापडलेली हस्तिदंती बाहुलीचे हि ईटलीमधील पॉम्पे इथे सापडलेल्या हस्तिदंती मुर्तीशी खुप साम्य आहे. आतापर्यंत कर्नाटकामधील कलबुर्गी जिल्ह्यातील संती कंगनहल्ली हि प्राचीन व्यपारी पेठ आहे अशी तज्ज्ञांची मान्यता होती, पण याच्यामध्ञे तेर देखील येते हे सिध्द झाले.  या प्रदेशातीळ पुरातन अवशेष आणि सातवाहन संबधीत ग्रंथामधून या गोष्टी सामोर्या आल्या. याच अनुषंगाने तीर्थ ( बुद्रुक ) गावामध्ये बौद्ध धर्माशी संबंधित शिल्प आणि स्तूप असे अवशेष सापडले.
तीर्थ ( बुद्रुक ) परिसर

महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात तुळजापुरपासून ९ कि.मी. अंतरावर तिर्थ ( बुद्रुक ) नावाचे गाव बालाघाट डोंगररांगेत स्थित आहे. सन २००१ मध्ये एक आश्रम बांधण्यासाठी एका टेकडीचे खोदकाम सुरु होते. खोदण्याचे काम सुरु असताना मोठ्या वीटा इथे सापडल्या. हि बातमी लगेच पसरली. महाराष्ट्र पुरातत्व खात्याच्या प्रमुखांनी इथे भेट दिली आणि याची चौकशी केली. उत्खनन झाल्यावर इथे मोठ्या वीटांनी बांधलेला गोलाकार स्तुप इथे सापडला. मात्र याबाबतीत पुढे काही झाले नाही. पुढे २००८-०९ या दरम्यान तीर्थ ( बुद्रुक ) गावापासून १६ कि.मी.वर असलेल्या अपशिंगा गावात सातवाहनकालीन स्तुप सापडला. या वास्तुवर पुढे २०१३ मध्ये शोधनिबंध प्रजाशित झाला.
सातवाहनकालीन अवशेष सापडलेली भीमाशंकर टेकडी

या गावाच्या परिसरात सापडलेले अवशेष, मुर्ती गावातील भैरवनाथाच्या मंदीराच्या आवारात ठेवलेल्या आहेत. गावाजवळ असलेल्या भीमाशंकर टेकडीवर असलेले मंदीर भग्न झालेले होते. इथे सापडलेल्या स्तुपाच्या अवशेषाचे साम्य अमरावरी आणि सन्नत कगनहल्ली इथे सापडलेल्या स्तुपाशी आहे. याशिवाय इथे सातवाहनकालीन खापरे, तसेच पद्म पदक सापडले. 
काळभैरवनाथ मंदीराचा परिसर

तीर्थ ( बुद्रुक ) येथील स्तुपाचे अवशेष


भीमाशंकर मंदीराचे अवशेष 

स्तुपावर असलेले चक्र चिन्ह

कालभैरवनाथाचे मंदिर, तिर्थ बुद्रुक
भैरव, कालभैरवनाथ मंदिर, तिर्थ बुद्रुक
महिषासुरमर्दिनी, तिर्थ बुद्रुक
वीरगळ तसेच नाग शिल्प, तिर्थ बुद्रुक
वीरगळ (hero stone), तिर्थ बुद्रुक
नंदी, तिर्थ बुद्रुक
स्तुपावर असलेले चुन्याच्या दगडात बनवलेले शिल्प 
हंसपट्टिका, तिर्थ बुद्रुक

   याशिवाय इथे मध्ययुगीन अवशेष सापडले, त्यात भीमाशंकर टेकडीवर असलेल्या भैरवनाथ मंदीरात शिवलिंग, भैरव, महिषासुर मर्दिनी, विष्णु यांच्या मुर्ती, तसेच नंदी शिल्प, सतीशिळा, वीरगळ, तसेच मंदीराशी संबधीत शिलालेख असे अवशेष सापडले. 
बहुधा मोराचे शिल्प, तिर्थ बुद्रुक
भग्न स्तुपाचे अवशेष
प्राचीन टेकडीचा एक भाग, तिर्थ बुद्रुक
सातवाहनकालीन वीटांनी निर्मित भिंत, तिर्थ बुद्रुक
स्तूपाशी संबंधित अवशेष, तिर्थ बुद्रुक
टेकडीचा एक भाग तिर्थ बुद्रुक

सातवाहनाकालीन स्तुप या व्यापारी मार्गावर फक्त तेरला सापडले, मात्र तीर्थ बुद्रुक इथे मोठा स्तुप असावा. यामुळे सन्नतीकडे जाणार्या व्यापारी मार्ग इथूनच जात असावा. अर्थात इथे तेर इतकी मोठी वसाहत नाही, तरी धाराशिव जिल्ह्यात सिध्देश्वर वडगाव गावातील सिध्देश्वर मंदीराजवळ सातवाहनकालीन स्थापत्य सापडले. इथे सातवाहनकालीन वीटा मोठ्या प्रमाणात सापडतात.
  तीर्थ बुद्रुक इथे सापडलेल्या मुर्ती सातवाहनकालीन असाव्यात. या शिल्पपटात एक पुरुष आणि तीन स्त्रीया दाखवलेल्या आहेत. 
  या शिल्पासाठी वापरलेला चुना दक्षीण महाराष्ट्रात सापडत नाही, याचा अर्थ हा चुना व्यापारी मार्गाने सन्नती शहाबाद येथून व्यापारी मार्गाने आणला असावा. कनगनहल्ली येथील स्तुप उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात चुन्याचा दगडाचा वापर केला होता. सातवाहनकालीन अन्य स्तुपांच्या रचनेचा अभ्यास केला तर लक्षात येते कि हा स्तुप हीनयान संप्रदायाने उभारलेला असावा. अमरावती येथील स्तुपाच्या उभारणीच्या नंतरच्या काळातील हे स्तुप असावे. अशीच शिल्प तेर इथेही सापडली असल्यामुळे कदाचित अमरावतीचा शैलीचा प्रभाव पडून त्याच्या नंतरच्या काळात तेर आणि तीर्थ ( बुद्रुक ) इथल्या स्तुपाची उभारणी झालेली असावी. 
अपशिंगा गावात सापडलेली सातवाहनकालातील वीटांची भिंत
वडगाव सिध्देश्वर येथील टेकडी, याच टेकडीमध्ये स्तुप असावा
गडदेवदरी येथील प्राचीन अवशेष सापडलेली टेकडी

   सातवाहन स्थापत्याचे अवशेष धाराशिव जिल्ह्यात गड देवदरी, तेर, वडगाव सिध्देश्वर तसेच अपशिंगा या गावात आढळून येतात. मात्र यातील वडगाव आणि अपशिंगा गावातील अवशेष बौध्द धर्माशी संबधीत आहेत याचा स्पष्ट पुरावा मिलालेला नाही. 
सातवाहनकालीम अवशेष सापडल्यामुळे मराठवाड्यातील या परिसराचे एतिहासिक दृष्टीने महत्व वाढले आहे. तसेच हा परिसर जागतिक पटलावर आलेला आहे. 

संदर्भ ग्रंथ

१)  खरे, ग. ह., ‘तेर येथील चार शिलालेख’, भारत इतिहास संशोधक मंडळ, वार्षिक, वर्ष-१४, अंक ४. १९३४. पुणे.
२ )  दीक्षित, मो. ग., ‘तेर वस्तुसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचा परिचय’, भारतीय इतिहास आणि संस्कृती, वर्ष ९, १९७२. मुंबई मराठी संग्रहालय, मुंबई.
३ )देव, शां. भा. ‘तेर’, पुरातत्त्व-शोध-निबंधमाला, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, १९८७. मुंबई.
४ ) Mate, M.S. 1957, ‘Trivikram Temple at Ter’ Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, Poona,Vol. XVIII, pp.1-4.



तिर्थ बुद्रुक : सातवाहनकालीन बौद्ध केंद्र

संभवतः गौतम बुद्ध के जीवन से संबंधित घटना (सफ़ेद चूना पत्थर में  बना शिल्प)

आज से लगभग १८०० साल पूर्व वर्तमान महाराष्ट्र सहित दक्षिण भारत के अधिकांश हिस्से पर सातवाहनों का अधिकार था. इनका व्यापार यूरोप के रोमन साम्राज्य के साथ भी हुआ करता था. रोमन साम्राज्य से विभिन्न प्रकार का सामान भारतीय प्रायद्विप के पश्चिमी समुद्री तट पर बने बंदरगाहों तक जहाजों के माध्यम से आया करता था. इन बंदरगाहों से भारत के अंदरूनी प्रदेशों से व्यापारी-सामान रोमन साम्राज्य के लिए निर्यात किया जाता था. हमारे व्यापारी भी इस वैश्विक व्यापार में निपुण थे. मसाले, मणि, सूती कपड़ा तथा अन्य जीवनावश्यक वस्तुओं का लेन-देन व्यापार के माध्यम से हुआ करता था. यह व्यापार सातवाहनकाल में अपनी चरम सीमा तक पहुँच चुका था. इसी कारण से भड़ोच, शुर्पारक (नाला सोपारा), कल्याण, चौल, ब्रह्मपुरी, भोकरधन, अरिकामेडू आदि व्यापारिक केन्द्रों एवं शहरों का विकास दिन-दूनी रात चौगुनी गति से हो रहा था.

तिर्थ बुद्रुक के निवासी

जीवन के हर अंग जैसे समाज, संस्कृति, धर्म, व्यापार, शिल्पकला एवं स्थापत्य में भी तेजी से विकास हो रहा था. इस समय बौद्ध धर्म का प्रचलन इस प्रदेश में अधिक था. बौद्धों से संबंधित स्तूप, विहार, मठ आदि वास्तुओं का निर्माण द्रुतगति से हो रहा था. भारतीय महाद्वीप में अनेक व्यापारिक मार्गों का निर्माण हो चुका था. या पहले से प्रचलन में रह चुके मार्गों का महत्त्व अब बढ़ चुका था. इनमें से एक मार्ग महाराष्ट्र के मराठवाड़ा (मध्य महाराष्ट्र) क्षेत्र से होकर गुजरता था, जिसे उस समय ‘दक्षिणापथ’ के नाम से भी जाना जाता था. मराठवाड़ा के पैठण और तगर (तेर) नामक समृद्ध केन्द्रों का नाम रोमन साम्राज्य तक पहुँच चुका था.

तेर से प्राप्त मृणमूर्तियाँ (टेराकोटा), तेर (तेर संग्रहालय से साभार)

तेर में सातवाहनों एवं रोमन सम्राज्य से संबंधित अवशेष पाए गए हैं. इनमें सिक्के, मर्तबान, हस्तिदंत से बनी स्त्रीमूर्ति, विभिन्न प्रकार के रोमन दीप आदि वस्तुएँ सम्मिलित थीं. तेर से प्राप्त हस्तिदंत से बनी मूर्ति इटली के पॉंपेई से प्राप्त मूर्ति से मिलती-जुलती है. अब तक तेर के बाद अगले पड़ाव के रूप में कर्नाटक के कलबुर्गी जिले में स्थित ‘सन्नती-कनगनहल्ली’ की चर्चा ही विद्वानों में थीं. लेकिन इन दोनों के बीच भी कुछ केन्द्रों का होना तय था. इसी दिशा में मैंने इस प्रदेश के प्राचीन पुरावशेषों से संबंधित ग्रंथों को पढ़ना एवं इस संबंधित स्थानों को भेंट देने का सिलसिला शुरू कर दिया. इसी प्रक्रिया का परिणाम था- तीर्थ बुद्रुक में नए सिरे से प्राप्त हुए बौद्ध धर्म से संबंधित शिल्प एवं स्तूप के संभावित अवशेषों की महत्त्वपूर्ण खोज.

भिमाशंकर टीला (सातवाहनकालीन स्तूप? के अवशेष), तिर्थ बुद्रुक

तीर्थ बुद्रुक नामक छोटासा गाँव महाराष्ट्र के उस्मानाबाद (प्राचीन धाराशिव) जिले के तुलजापुर तहसील से मात्र ९ किमी की दुरी पर बालाघाट पहाड़ियों की एक पहाड़ी पर स्थित है. 

तिर्थ बुद्रुक गाँव का परिदृश्य

सन २००१ में किसी साधू की कुटिया के लिए यहाँ पर स्थित एक टीले की खुदाई का काम चल रहा था. ग्रामीणों को खुदाई से बड़ी आकर की कुछ ईंटें बरामद हुई. यह काम तत्काल रोका गया. यह खबर हवा की तरह प्रदेश में फ़ैल गई. महाराष्ट्र के पुरातत्त्व विभाग के संचालक ने खबर सुनते ही उक्त स्थान की छान-बीन की. ये ईंटों से निर्मित एक गोलाकृति स्तूप के अवशेष थे (संभवतः यह एक अन्य मनौती स्तूप रहा होगा). उन्होंने बाद में इस संबंधी एक संक्षिप्त टिपण्णी विभाग की पत्रिका में भी छपवाई. ऐसा करते समय उन्होंने वहाँ पर पड़े अन्य महत्त्वपूर्ण पुरावशेषों एवं इस स्थान के प्राचीन महत्त्व की ओर अधिक ध्यान नहीं दिया. इसके बाद इस स्थान के बारे में कहीं कुछ ख़ास लिखने या सुनने में नहीं मिला.

कालभैरवनाथ मंदिर एवं आस-पास का सामान्य दृश्य, तिर्थ बुद्रुक

सन २००८-०९ में मेरे अपने गाँव अपसिंगा में सातवाहनकालीन अवशेष प्राप्त हुए, जो तिर्थ बुद्रुक से महज १६ किमी की दुरी पर स्थित है. यहाँ एक प्राचीन ढाँचे की रचना मिली, जो संभवतः किसी स्तूप की भी हो सकती है. तत्पश्चात २०१३ में इन अवशेषों पर एक शोधलेख भी प्रकाशित किया गया. 

अपसिंगा (सातवाहनकालीन  पुरास्थल) से प्राप्त ईंटों की संरचना

२०१३ में मैंने तिर्थ बुद्रुक के लगभग १४वीं सदी में निर्मित कालभैरवनाथ मंदिर को भेंट दी. इस मंदिर के प्रांगण में रखे कुछ शिल्प दिखाई पड़े. 

डेक्कन कॉलेज, पुणे में मंदिर एवं स्थापत्य की पढ़ाई का अनुभव यहाँ काम आया. इसी दौरान मैं डेक्कन कॉलेज से पी.एचडी भी कर रहा था. सर्वेक्षण का कार्य सर्वत्र शुरू था. मंदिर के सामने रखे सफ़ेद चूना पत्थर (लाइमस्टोन) में बने शिल्प मुझे कुछ अलग लगे. मैंने आस-पास के क्षेत्र की अधिक छान-बीन की. इसमें मुझे स्तूप के लिए सफ़ेद चूना पत्थर में बने अलंकृत रचनाओं के अवशेष दिखाई पड़े. 

स्तूप के अवशेष, तिर्थ बुद्रुक

यहाँ पर लगभग १३वीं सदी में बने भिमाशंकर टीले पर भी सातवाहनकालीन ईंटे तथा ईंटों से बनी किसी स्थापत्य-रचना के अवशेष दिखाई दिए. यह मंदिर तथा प्राचीन टीला खंडहर में बदल चुके थे. 

प्राचीन टीले पर बने भिमाशंकर मंदिर के अवशेष, तिर्थ बुद्रुक


भिमाशंकर मंदिर के अवशेष, तिर्थ बुद्रुक

इसके बाद कईं बार मैंने इस क्षेत्र का दौरा एवं सर्वेक्षण किया. इसकी विस्तृत जानकारी प्राप्त करने के बाद मुझे ज्ञात हुआ कि यहाँ पर पड़े शिल्प एवं अन्य अवशेष अमरावती और सन्नती-कनगनहल्ली के स्तूपों से मिलते-जुलते हैं. यहाँ से चूना पत्थर में बने शिल्पों के साथ सातवाहनकालीन मृद्भांड के ठिकरें, घर की छत पर लगाए जाने वाले खपरैल (tiles) तथा पद्म पदक (medallions) भी प्राप्त हुए हैं. 

स्तूप से संबंधित पद्म पदक (Medallion), तिर्थ बुद्रुक

मध्ययुगीन अवशेषों में भिमाशंकर एवं कालभैरवनाथ मंदिर के अवशेष, शिवलिंग, भैरव, महिषासुर मर्दिनी, विष्णु के शिल्प, वीरगल (hero stones), सती शिला, नंदी की प्रतिमाएँ, मंदिर से संबंधित शिलालेख आदि अवशेष प्रमुख हैं.

कालभैरवनाथ का मंदिर, तिर्थ बुद्रुक


भैरव, कालभैरवनाथ मंदिर, तिर्थ बुद्रुक
महिषासुरमर्दिनी, तिर्थ बुद्रुक

मैंने २०१५ में हैदराबाद में संपन्न पुरातत्त्व से संबंधित अंतर्राष्ट्रीय सेमिनार में तिर्थ बुद्रुक के इन पुरावशेषों सहित यहाँ के मध्ययुगीन अवशेषों पर शोधकार्य प्रस्तुत किया था.

वीरगल एवं नाग शिल्प, तिर्थ बुद्रुक

वीरगल (hero stone), तिर्थ बुद्रुक

नंदी, तिर्थ बुद्रुक

तिर्थ बुद्रुक से प्राप्त आद्य ऐतिहासिक अवशेषों का संबंध सातवाहनकाल से था. इस समय इंडो-रोमन व्यापार अपनी चरम सीमा पर था तथा व्यापारियों का आवागमन इस क्षेत्र में हुआ करता था. लगभग इसविसन की १ से ३री सदी में यहाँ चूना पत्थर एवं ईंटों से निर्मित स्तूप का निर्माण कार्य हुआ होगा. संभवतः समृद्ध व्यापर के चलते यह कार्य सफल हुआ था. अबतक दक्षिणापथ के इस व्यापारी मार्ग पर महाराष्ट्र में तेर के बाद भव्य वास्तु के अवशेष प्राप्त नहीं हुए थे. तीर्थ बुद्रुक के स्तुपावशेषों से यह बात सामने आ रही है कि तेर के बाद व्यापारी मार्ग पर तिर्थ बुद्रुक एक महत्त्वपूर्ण पड़ाव था, जो आगे जाकर सन्नती नामक स्थान से जुड़ जाता था, जबकि यह तेर इतनी विस्तृत बस्ती नहीं थी. हालाँकि इसी जिले के सिद्धेश्वर वडगाँव के सिद्धेश्वर मंदिर के पास सातवाहनकालीन एक स्थापत्य रचना प्राप्त हुई है. यहाँ पर इस काल से संबंधित ईंटें बड़ी संख्या में मिलती हैं.

संभवतः स्तूप का टीला, वडगाँव सिद्धेश्वर

तिर्थ बुद्रुक से प्राप्त शिल्प संभवतः गौतम बुद्ध के जीवन से संबंधित है. इसमें एक पुरुष एवं तीन स्त्रियों को दर्शाया गया है. 

स्तूप से जुड़ा चूना पत्थर में बना शिल्प 

हंसपट्टिका, तिर्थ बुद्रुक


इन शिल्पों के लिए प्रयोग किया गया सफ़ेद चूना पत्थर (limestone) दक्षिण महाराष्ट्र में नहीं मिलता. इसलिए अब यह निश्चित रूप से कहा जा सकता है कि यह पत्थर सन्नती-शहाबाद के क्षेत्र से यहाँ व्यापारी मार्ग से लाया गया था. कनगनहल्ली के स्तूप को सजाने के लिए वहाँ से बड़ी तादाद में मिलने वाले सफ़ेद चूना पत्थर का ही इस्तेमाल किया गया था. सातवाहनकालीन अन्य शिल्पों एवं स्थापत्य रचना को देखकर यह अनुमान लगाया जा सकता है कि यह स्तूप हीनयान मत से संबंधित रहा होगा. यहाँ के शिल्प अमरावती शैली में बनवाए गए हैं. यह स्थान अमरावती शैली में बने शिल्पों का एक महत्त्वपूर्ण उत्तरी केंद्र माना जा सकता है. अपितु, इस प्रकार के कुछ अवशेष तेर नामक स्थान पर भी मौजूद होने के कारण, अब तेर यह स्थान अमरावती शैली में बने शिल्पों के फैलाव की उत्तरी सीमा बताई जा सकती है. तिर्थ बुद्रुक और तेर के शिल्पों की शैली अमरावती होकर उक्त शिल्पों की रचना कनगनहल्ली और अमरावती से थोड़ी सी भिन्न दिखाई देती है. संभवतः इस पर स्थानीय कारीगरी का प्रभाव पड़ा हो.

संभवतः मोर की  आकृति, तिर्थ बुद्रुक


खंडित स्तूप (लाट) के अवशेष


प्राचीन टीले का एक हिस्सा, तिर्थ बुद्रुक



सातवाहनकालीन ईंटों से निर्मित दीवार, तिर्थ बुद्रुक


स्तूप संबंधित अवशेष, तिर्थ बुद्रुक

टीले का एक खुला भाग, तिर्थ बुद्रुक

सातवाहनकालीन स्थापत्य रचना के अवशेष उस्मानाबाद जिले में गड देवदरी, तेर, वडगाँव-सिद्धेश्वर एवं अपसिंगा में भी दिखाई देते हैं. इनमें से वडगाँव और अपसिंगा की स्थापत्य रचना बौद्ध-स्तूप से संबंधित होने के प्रमाण अब तक मौजूद नहीं हैं. 

गड देवदरी का प्राचीन टीला, गडदेवदरी

इन समृद्ध अवशेषों के मिल जाने से ऐतिहासिक दृष्टि से मराठवाड़ा के इस क्षेत्र का महत्त्व बढ़ चुका है तथा तिर्थ बुद्रुक यह स्थान सातवाहनकालीन एक बौद्ध केंद्र के रूप में वैश्विक पटल पर स्थापित होने में मदद मिली है.  


https://www.youtube.com/watch?v=uYsgUkxAFR8
 
 
 

सातवाहन व्यापारातील महत्वाचे केंद्र : तगरपूर अर्थात तेर

Periplus of Erythrean Sea या पहिल्या शतकातील पुस्तकात रोमन आणि इजिप्शियन व्यापाऱ्यांना भारतातील व्यवसायिक संधींबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. या पुस्तकात आजच्या भारत आणि पाकिस्तानमधिल ब~याच शहरांबद्दल माहिती सापडते. सोबतच सातवाहन काळातील व्यापारी जाळ्यांबद्दल देखिल विस्तृत स्वरूपात माहिती मिळते. यामध्ये आजच्या कल्याण, उज्जैन, पैठण, नालासोपारा, तिरूचिरापल्ली, पुदुच्चेरी अशा शहरांचा उल्लेख सापडतो. यामध्येच तगरनगर अथवा तगरपूर या एका महत्वाच्या व्यापारी केंद्राचा उल्लेख देखिल दिसून येतो. हे तगरपूर म्हणजे आजच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तेर हे गाव आहे.

Periplus of Erythrean Sea नुसार व्यापारी नकाशा

तेर हे सातवाहन काळात जसे व्यवसायिक दृष्टीने महत्वाचे केंद्र होते, तसेच ते सांस्कृतिक दृष्टीने देखिल अतिशय महत्वपूर्ण केंद्र राहिलेले आहे. या गावात हिंदू, बौद्ध आणि जैन या तीन धर्मांची विविध प्रार्थनास्थळे एकत्र नांदत होती हे उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमध्ये दिसून येते.

तेर मध्ये झालेली पुरातत्व उत्खनने

तेर मध्ये सर्वप्रथम १९५७-५८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या (तत्कालिन बॉम्बे रेसिडेन्सी) Archives and museum विभागातर्फे उत्खनन पार पडले. या उत्खननामध्ये सर्वप्रथम तेर शहर इस पूर्व ४ थे शतक ते इस ४ थे शतक या काळात अतिशय गजबजलेले होते ही बाब समोर आली. याच उत्खननात मातीपासून बनलेले (terracotta) बरेच खेळणी, लहान मुर्त्या, भांडी, दागिने आणि इतर वस्तू दिसून आल्या. १९६६ ते ६९ दरम्यान याच विभागातर्फे पुन्हा एकदा विस्तृत असे उत्खनन येथे पार पडले. तत्पुर्वी गावातील जुने जमिनदार श्री रामलिंगप्पा लामतुरे यांनी गावात विविध ठिकाणी सापडलेल्या आणि त्यांच्याजवळ असलेल्या वस्तूंबद्दल शासनास माहिती दिली होती. आणि याच माहितीच्या आधारावर अधिक विस्तृत उत्खनन सुरू करण्यात आले होते. या उत्खननात तेर शहरातील ऐतिहासिक वसाहतींबद्दल माहिती मिळाली. या उत्खननात सापडलेल्या माहितीनुसार परिसरातील सर्वात जुनी वसाहत मौर्य काळात (इस पूर्व ३ रे शतक ते इस पूर्व १ ले शतक) या काळातील होती. ही वसाहत एका मोठ्या पुरामध्ये नष्ट झाली होती. दुसरी वसाहत इस पूर्व १ ले शतक ते इस १ ले शतक या काळातील आहे. या वसाहतीच्या अखेरील शहरात एक मोठी लागली होती, ज्यामध्ये बरीच घरे जळून खाक झाली होती. तिसरा सर्वात महत्वपूर्ण टप्पा इस ५० ते इस २०० च्या काळातील आहे. याच काळात हे शहर खूप मोठे व्यवसायिक केंद्र म्हणुन उदयास आले होते.

आजच्या तेरणा नदीच्या काठावर बरीच रोमन कालिन वस्तू आणि घरांचे अवशेष सापडले आहे. यामध्ये रोमन कालिन अथवा रोमन शैलीतील मातीची खेळणी, मुर्त्या, दिवे, भांडे, रोमन नाणी, जवाहिर अशा वस्तूंचा समावेश आहे. या उत्खननात सापडलेल्या घरांच्या पायांमध्ये एक विशेष बाब होती. या सर्वच घरांचे पाये हे, पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी उंच भिंती बांधलेल्या होत्या, याचा पुरावा देणारे आहेत. यामुळे परिसरात वारंवार तेरणा नदिला पूर येत असे हे लक्षात येते.

याच टप्प्यात चक्राकार आकार असलेल्या एका स्तुपाचे अवशेष सापडले. सातवाहन वंशाच्या पुलुमावी राजाच्या काळातील एक नाणेदेखिल याच ठिकाणी सापडले. यावरून हे स्तुप दुस~या शतकाच्या उत्तरार्थातील असल्याचे लक्षात येते. सोबतच त्रीविक्रम मंदिराजवळच हस्तिपृष्ठ शैलीतील (apsidal) विटांचे बांधकाम असलेले एक अवशेष देखील सापडले. या अवशेषामध्ये एक मोठे मंडपदेखील होते, जे कदाचित लाकडी खांबावर उभे होते.

तेर येथे उत्खननात सापडलेले स्तुपाचे अवशेष

या टप्प्यात ब~याच गैर भारतीय वस्तू देखिल सापडल्या. ज्यामध्ये कार्नेलियन शिक्के, मातीचे खेळणे, आणि विशेष प्रकारचे दिवे यांचा समावेश आहे. Periplus of Erythrean Sea या पुस्तकात उल्लेख आहे की दक्षिण भारतातून निर्यातयोग्य सामान तगर येथे येत असे. आणि तेथून पैठण मार्गे पश्चिम किना~यावरील बंदरावर पाठविले जात असे. सोबतच येथे उत्तम प्रतिच्या कापडाची निर्मिती होत असे. उत्खननात सापडलेले कापडाला रंग करण्यासाठी बनलेले खड्डे या गोष्टीची साक्ष देतात.

उत्खननाचा तिसरा टप्पा १९७४-७५ या काळात पार पडला. सातवाहन काळातील सांस्कृतिक आणि व्यवसायिक स्वरूप समजून घेण्यासाठी हे उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात पुन्हा एकदा येथील वसाहतीच्या तीन टप्प्यांवर शिक्कामोर्तब झाले. सातवाहन काळातील व्यवसायिक भरभराटीचे देखिल पुरावे या उत्खननात सापडले. या उत्खननात तेरच्या दक्षिण पूर्व दिशेला १६ किमी अंतरावर इर्ले या गावात एक स्तुपवजा टेकडी सापडली होती. या टेकडीवर पुढील काळात उत्खनन होऊ शकले नाही.

उत्खननाचा चौथा टप्पा १९८७-८९ या काळात पार पडला. या उत्खननात एक विटांनी बनलेले बारव सापडले. या बारवजवळच एक हस्तिपृष्ठ शैलीतील इमारतीचे अवशेष देखिल सापडले होते. सोबतच चुनखडीच्या खांबांचे अवशेष, भांडी, बांधकामाचे अवशेष आणि इतर ब~याचश्या वस्तू या उत्खननात सापडल्या. पुढे २०२० मध्ये एका इमारतीच्या बांधकामादरम्यान सातवाहन काळातील एक विहीर सापडली.

तेरच्या आजूबाजूला आजही ब~याचश्या टेकड्या आणि जागा उत्खनन आणि संशोधनासाठी अंकित करण्यात आलेल्या आहेत. येत्या काळात या जागांवर उत्खनन होऊन आणखी बरीच तथ्ये आणि अवशेष सापडतील अशी अपेक्षा आहे.

आजचे तेर

आजच्या धाराशिव जिल्ह्यात तेर हे एक छोटेसे खेडेगाव आहे, जे संत गोरोबा काका यांच्या मंदिरासाठी जास्त प्रसिद्ध आहे. वारकरी संप्रदायातील मध्ययुगिन संत असलेल्या गोरोबा काका यांचे मंदिर तेरणा नदिच्या काठावर वसलेले आहे. याच मंदिराच्या परिसरात एक प्राचिन हस्तिपृष्ठ शैलीचे मंदिर आहे. या काळेश्वर मंदिराचे शिखर हे हस्तिपृष्ठ आणि स्तंभ बांधकामाचे मिश्रण आहे. पुरातत्वात आवड असणा~या व्यक्तींमध्ये विशेष प्रसिद्ध असलेले त्रिविक्रम मंदिर हे हस्तिपृष्ठ शैलीतील मंदिर गावाच्या मध्यभागी वसलेले आहे. आज पुर्णत: हस्तिपृष्ठ शैलीतील शिल्लक असलेल्या केवळ दोन मंदिरांपैकी हे एक आहे (दुसरे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर जिल्ह्यात छेजरला येथे आहे). मंदिर बांधणी शैलीच्या उत्क्रांतीमधिल एक महत्वाचा दुवा म्हणून या मंदिराकडे पाहता येईल

त्रीविक्रम मंदिर , तेर

सुरूवातीला हे मंदिर एक पूर्णत: हस्तिपृष्ठ शैलीचे स्मारक होते. या मंदिराची शैली लेण्यांमधिल चैत्यासोबत खूप साधर्म्य असणारी आहे. पुढील काळात (कदाचित ६ व्या शतकात) या स्मारकात सपाट छत असलेल्या एका मंडपाची भर टाकली गेली. या मंदिराची हस्तिपृष्ठ शैली ही तक्षशिला (इस पूर्व ३० ते इस ५०) येथे सापडलेल्या स्मारकांच्या संरचनेशी खूप साधर्म्य असणारी आहे. त्यामुळे त्रीविक्रम मंदिर हेदेखिल त्याच काळातील असावे असा संशोधकांचा अंदाज आहे. सातवाहन काळातील या मंदिरात आज विष्णूच्या वामन अवताराची त्रीविक्रम प्रतिमा विराजमान आहे. त्रीविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचिन बांधकाम म्हणून ओळखले जाते. हस्तिपृष्ठ शैली आजच्या काळात दुर्मिळ असली तरी या गावात या शैलीचे बरेच अवशेष सापडले आहेत. त्यामुळे स्तुपांपासून चौरस अथवा आयताकृती मंदिरांकडे झालेल्या स्थित्यांतरातील एक महत्वाचा दुवा म्हणून आपण तेर गावाकडे पाहू शकतो.

याच स्थित्यांतरातील आणखी एक महत्वाचा दुवा आहे तेर मधिल उत्तरेश्वर मंदिर. विटांचे बांधकाम असलेल्या या मंदिरामध्ये विटांसोबतच लाकडाचा देखिल बांधकामासाठी झालेला वापर दिसून येतो. या मंदिराच्या गर्भगृहातील द्वारशाखा तत्कालिन लाकडी कलाकुसरीचा एक उत्तम नमुना आहे. आज ही द्वारशाखा गावातील पुरातत्विय वास्तुसंग्रहात ठेवलेली आहे.

उत्तरेश्वर मंदिर, तेर

गावात झालेल्या उत्खननांमध्ये स्तुपांचे बरेच अवशेष सापडलेले आहेत. काही भांड्यांवर त्रीरत्न (बुद्ध, धर्म आणि संघ यांना दर्शविनारे एक बुद्ध धर्मातील चिन्ह) हे चिन्ह अंकित केलेले सापडले आहे. यावरून या भागात बौद्ध धर्माचा देखिल असणारा प्रभाव लक्षात येतो. जवळच असलेल्या धाराशिव आणि खरोसा येथील लेण्यांमध्ये बौद्ध धर्माचे असलेले शिल्प देखील या गोष्टीची ग्वाही देतात.

तेर येथे एक पुरातन दिगंबर जैन मंदिरदेखिल आहे, जे या प्रदेशातील जैन धर्माच्या प्रभावाची जाणिव करून देते. या मंदिरास जैन धर्मामध्ये “अतिशय क्षेत्र” (खूप जास्त पवित्र असणारे ठिकाण) असे संबोधले जाते. जवळपासच्या भागात खूप ठिकाणी सापडलेले जैन अवशेष आणि धाराशिव लेण्यांमध्ये असलेले जैन शिल्प हे या भागात असलेल्या जैन धर्माच्या प्रसाराची जाणिव करून देतात. आज येथे असलेले मंदिर हे साधारणत: १२ व्या शतकातील आहे. येथील पार्श्वनाथ मंदिराच्या पुनर्निमाणाच्या वेळी जैन धर्माशी संबंधित बरीचशी शिल्पे सापडली आहेत. त्यामुळे १२ व्या शतकाच्या आधीसुद्धा तेरमध्ये जैन धर्माचा प्रभाव होता हे लक्षात येते. ही सर्व शिल्पे आज मंदिरात ठेवण्यात आलेली आहेत.

जैन मंदिराच्या बांधकामाच्या वेळी सापडलेले अवशेष

तेर गावात एक पुरातत्विय संग्रहालय देखिल आहे. गावातील जुने जमिनदार कै रामलिंगप्पा लामतुरे ( ज्यांनी त्यांच्याकडे असलेला पुरातत्विय ठेवा सरकारला भेट केला) यांच्या नावाने हे संग्रहालय उभे केले गेलेले आहे. पुरातत्विय आणि इतिहासप्रेमींसाठी हे संग्रहालय एक अमूल्य असा ज्ञानाचा ठेवा आहे.

तेरबद्दल एक मजेशिर बाब

खिचडी हे आजच्या काळात एक अतिशय महत्वपूर्ण असा खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ आपल्याकडे २००० वर्षांपूर्वी देखिल अस्तित्वात होता याचे पुरावे तेर येथील उत्खननात सापडले आहेत. तेर मध्ये उत्खननात एका भांड्यामध्ये भात आणि मुंग दाळ यांना एकत्र करून बनविलेल्या पदार्थाचे अवशेष सापडले आहेत. यावरून या भागात २ सहस्त्रकांआधी खिचडी हा पदार्थ बनविला जात होता हे लक्षात येते.

 https://indiantempless.in/marathi/37/
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...