कल्याणचा इतिहास
न बदलता काळाच्या पडद्यावर आपली मोहोर उमटवणाऱ्या कल्याण शहराची गाथा!
डॉ. सूरज अ. पंडित
सातवाहन काळापासून कल्याण, घारापुरी यासारख्या वसाहती समृद्ध झाल्या होत्या. सातवाहन काळात कल्याणला गांधारमधून आलेल्या यवनांच्या वसाहती असाव्यात, असे डॉक्टर म.के. ढवळीकर यांचे मत आहे. सहाव्या-सातव्या शतकांपासूनच कल्याणला हिंदूंबरोबरच ख्रिश्चनांचीही वस्ती असल्याचे काही लिखित साधनांच्या आधारे ज्ञात आहे. इस्लामच्या उदयानंतर थोड्याच काळात कल्याण परिसरात मुसलमानांच्या वसाहती वाढीस लागल्या. यापूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे शिलाहार काळात अरब मुस्लिम, पारशी आणि हिंदू संपूर्ण उत्तर कोकणात गुण्यागोविंदाने राहत होते. अर्थात, कल्याणही याला अपवाद नसावे.
उल्हास नदी साधारण कल्याणच्या उत्तरेकडून अनेक नागमोडी वळणे घेत दक्षिणेला वळते. अशाच एका अश्वनालाकृती वळणावर प्राचीन कल्याणचे अवशेष विखुरले होते. नदीच्या पूर्वेकडील काठावर, जिथे आजही आधुनिक कल्याण वसलेले आहे, तेथे प्राचीन पुरावशेषांचे पुरातत्त्वीय टेकाड होते. आधुनिक काळातील नागरिकीकरणाच्या प्रक्रि येत हे पुरावशेष नामशेष झाले.
साधारण दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंत कल्याणच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली. याच काळात मध्ययुगीन कल्याणचा पाया रचला गेला. सातवाहन काळापासूनच सोपारा आणि कल्याण राजकीयदृष्ट्या दोन महत्त्वाची शहरे होती. एकूणच, या परिसरातील व्यापार, नैसर्गिक साधनसंपत्तीवर वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक राजवटींमध्ये या दोन शहरांवरून युद्धे झाली, राजकीय डावपेच खेळले गेले. हे कितीही सत्य असले, तरी इतिहासात कल्याण या शहराला सोपाऱ्यानंतरचेच स्थान मिळाले.
उल्हास नदीच्या पूर्वेला जसे कल्याण आहे तसेच पश्चिमेला भिवंडी आहे. आजही कल्याण-भिवंडी ही दोन्ही जुळी शहरे म्हणून ओळखली जातात. मध्ययुगीन इतिहासात या दोन्ही शहरांनी मोलाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार बांधले, ते याच खाडीत. भिवंडी परिसरात पूर्वी काही सातवाहनकालीन वसाहती असाव्यात, असे पुरावशेषांवरून वाटत असले, तरी येथे एक नागरी वसाहत असण्याची शक्यता फारच धूसर आहे. शिलाहार काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्या असाव्यात.
कल्याणबरोबरच भिवंडी परिसरातील कामणदुर्गापासून गुमतारादुर्गाच्या पायथ्यापर्यंत काही मंदिरांचे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात. उल्हास नदीच्या पूर्वेला, कल्याणच्या पलीकडील तीरावर धूळखाडी, सोनाळे, भिनार आणि लोणार परिसरात मोठ्या प्रमाणात शिलाहारकालीन स्थापत्य व शिल्पांचे भग्नावशेष सापडले आहेत. अर्थातच, आधुनिक वसाहतींनी या पुरातन ठेव्याचे मोठे नुकसान केले असले, तरी शिलाहारकालीन वसाहतींची साक्ष देणारे थोडेफार अवशेष आजही शिल्लक आहेत. लोणार येथील मंदिर व मीठ यांचे शिलाहारकालीन संदर्भ यापूर्वी आपण पाहिले आहेत. कालक्र मदृष्ट्या या साºया अवशेषांचा काळ दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंत जातो. पंधराव्या शतकापर्यंत कोणतेही महत्त्वाचे पुरावशेष या परिसरात पाहायला मिळत नाहीत.
सोपाºयाप्रमाणे सातवाहन काळापासून ज्ञात असलेले मुंबईच्या परिसरातील दुसरे शहर म्हणजे कल्याण. साधारण दहाव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत कल्याणच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली. पंधराव्या शतकापासून पुढे अगदी एकविसाव्या शतकापर्यंत कल्याणचा-भिवंडीचा इतिहास ज्ञात आहे. ही सातवाहन काळात सुरुवात झालेली वसाहत मानवी इतिहासाच्या विविध टप्प्यांत बहरत गेली. शिलाहार काळात तर नक्की या शहराचा पसारा किती होता, हे सांगणे कठीण आहे. उत्तरोत्तर उन्नत होत जाणारी आर्थिक परिस्थिती, हेच कल्याणच्या दोन हजार वर्षांच्या नागरी इतिहासाचे गमक होते. हीच आहे, गेल्या दोन हजार वर्षांत स्वत:चे नाव यत्किंचितही न बदलता काळाच्या पडद्यावर आपली मोहोर उमटवणाºया कल्याण शहराची गाथा.
(लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)
डॉ. श्रीनिवास साठे, इतिहास अभ्यासक
महाराष्ट्रात जी काही प्राचीन गावे आहेत, त्यात कल्याणचा क्रमांक हा वरचा आहे. खास करून पश्चिम किनाऱ्याचे एक सुसज्ज बंदर आणि उत्तर-मध्य भारताला जोडणारे घाट रस्ते. गेल्या दोन अडीच हजार वर्षांचा समृध्द इतिहास लाभलेले कल्याण स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत टुमदार गाव होते. प्राचीन, मध्ययुगीन व मराठा कालखंडाच्या खुणा शहराच्या मध्यावर, सीमेवर आणि परिसरात जिवंत होत्या. त्या ठिकाणी तटबंदी, भटाळे, डावजे, लेंडाळे तलाव, पारशी विहिर व सुंदर खाडी काठ होता. शहराच्या मध्यावर शंभर दोनशे कौलारु, दूसोपी, चौसोपी आखीव, रेखीव वाडे मराठा काळाची आठवण देत होते. मलीक अम्बर कालीन चौरस पोखरणी काठावरचा ‘टेम्पल कॉम्प्लेक्स’ कर्नाटक, केरळ व गोव्याची आठवण देई. सुभेदार वाडा, काळेवाडा, सरकार वाडा, पारनाका एखाद्या संस्थानाची झलक देई.ब्रिटीश काळात सुधारणा झाल्या. साधारण १८५४ मध्ये रेल्वे सुरु झाल्यावर गावात आलेले टांगे ही तेव्हा एक शान होती. पहिल्या पावसानंतर कौलारु लाल छप्परांचा गाव आणि लांब हिरवे निळे डोंगर, हाजीमलंग ते भिमाशंकर पर्यंतचा परिसर पाहून निसर्गाचा व या गावाचा हेवा वाटे. दक्षिणेला रेल्वेची गाडी आणि मुंब्रा डोंगर आपण मुंबईच्या जवळ आहे, याचे भान येई. पण संयुक्त महाराष्ट्र झाला आणि सर्व संदर्भच बदलले. राजकीय पक्षांचे पेव फुटले. गावाचा कळत नकळत एकोपा गेला. असुरी चढाओढ आली. सत्तेचा बाजार झाला आणि गावाची आत्मियता लोप पावू लागली. गावाच्या इतिहासाचा नावापुरता अभिमान राहून बाकी भौतिक सर्वत्र ‘अकल्याण’ होत गेले, असेच नाईलाजाने म्हणावे लागेल.
अशा सुंदर ‘स्वप्नातील कल्याणचे’ वर्तमान आज उद्धस्त झाले आहे. आज जे हरवलं आहे ते पुन्हा येणे शक्य नाही. तरीही, टिळक चौक, अन्सारी चौक ते दुर्गाडी किल्ला हा भाग आजही इतिहासाच्या खुणा जागवतो. कोकण इतिहास परिषद, कल्याण शाखेने अशी सुमारे बेचाळीस स्थळे निश्चित केली, ज्या योगे कल्याणमध्ये तासाभराचा ‘हेरिटेज वॉक’ होतो. कल्याणचा मध्ययुगीन, अर्वाचीन इतिहास त्यातून सहज उलगडू शकतो. एक इतिहसाचा विद्यार्थी, चाहता म्हणून माझ्या स्वप्नात तरी आता आहे त्यांचे संरक्षण, संवर्धन व प्रदर्शन करणे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यात ठळकपणे पोखरण पार, अधर दरवाजा, शाहीबावडी, धुरुवाडा अशा पंधरा वीस वास्तुंते जतन करणे गरजेचे आहे. त्यासाठी या भागातील पुनर्रचना, बांधकाम नियमावलीला विशेष दर्जा, महापालिका, नगरसेवक प्रशासनाने द्यायला हवा. त्यासाठी ‘एमएमआरडीए’, हेरिटेज सोसायटी, पर्यटन विभाग, पर्यावरण विभाग, पर्यावरण आणि स्मार्ट सिटी प्राधीकरणाकडे पाठपुरावा व्हायला हवा. सोळाव्या शतकात संपूर्ण जाळलेले लंडन तेथील नॅशनल म्युझियम मध्ये उभे केले गेले. त्याचप्रमाणे कल्याण तटबंदीतील गाव, आमचे वाडे, मंदिरे ही देखील प्रदर्शित करावी. त्यासाठी सर्व संस्थानी-महापालिकेने संयुक्त प्रकल्प राबवावा, ज्याचा पुढील पिढय़ांना मनोरंजना बरोबर वारसा रक्षणाची दृष्टी मिळून ती राखण्याची प्रेरणा मिळेल.
गेल्या ५०-६० वर्षांत एकूणच महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने वारसा पुसून टाकल्याचे चित्र दिसते. त्यासाठी जुन्या गावात एकदिशा मार्ग वाहनांचे रस्त्यावरील पार्किंग पूर्ण बंद करणे, जड वाहनांना प्रवेश बंदी, ध्वनी नियंत्रणा सारख्या अटी घालाव्यात. जुने केंब्रिज- ऑक्सफर्ड आज वस्ती वाढूनही १६-१७ व्या शतकातील माहोल राखून आहे. कल्याणचा दृष्टीने विचार आज पर्यंत ना नागरिकांनी केला, ना प्रशासानाने केला. जुन्या- जाणत्या संस्था, संघटना वा मंडळे ही फक्त सेलिब्रिटी बनून अल्पसंतुष्ट आहेत. वर्षांकाठी किमान पन्नास परदेशी अभ्यासक या गावात येतात किंवा ते इंटरनेटवर अभ्यासतात हे किती जण जाणतात? तेव्हा पुढच्या वीस वर्षांतील माझ्या स्वप्नातील कल्याण हे जगाच्या पाठीवर ऐतिहासिक ठेवा- जपणारे आदर्श ‘मराठी’ शहर असावे.
Roman Egypt to peninsular India (patterns of trade)
by Sunil Gupta | 1997 | 132,380 words
This essay examines the early maritime trade between India and the Roman Empire, focusing on archaeological evidence from the 1st century BC to the 3rd century AD. It analyzes artifacts from Mediterranean origin found in peninsular India and Indian Ocean regions, exploring trade routes, commodities, and business practices. It situates Indo-Roman tr...
[Full title: Indian Subcontinent; 1: Lower Indus and Western India; (3): Harbours and Coastal Settlements; (3) Konkan Coast (Maharashtra); (3) Kalliena/Kalyana/Kalyan]
Warning! Page nr. 72 has not been proofread. Click the page link to verify the generated OCR text with the original PDF.
The port of Kalliena is placed after Sopara in the list of the Periplus (sec. 52) The Geographia does not mention this port Kalliena is most certainly ancient Kalyana referred to in the Early Historic Buddhist caves at Kanheri in Mumbai. In fact, references to inhabitants of Kalyana predominate among the donative inscriptions at Kanheri (Luders' List nos 986, 1000, 1001, 1013, 1024, 1032 ). It has been suggested that the settlement of Elymaine plotted in the Peutinger Table is a Hellenised corruption of Kalyana (Gole 1983:28-29). The traveller Cosmas Indicopleustus records a visit to the port of Kalliena in the 6 th century A.D. (Christian Topography XI. 15). Schoff (1912/74:197) locates the old territory of Kalliena Kalyana 'on the eastern shore of the harbour of Bombay' and quotes Lassen to say that the 'name (Kalliena) also applied to the strip of coast on either side of the harbour. Huntingford (1980:114) places Kalliena 'on a river which enters the Gulf of Bombay' The geographical specifications provided by Schoff and Huntingford for the ancient harbour site in modern Kalyan are borne out by the existence of an Early Historic site
Warning! Page nr. 73 has not been proofread. Click the page link to verify the generated OCR text with the original PDF.
192 on the banks of the River Ulhas very near to its confluence with Thane Creek (Fig. 32) M.N. Deshpande (Indian Archaeology - A Review Luders 1957-58:67, personal communication) who first explored the site found it to be located at one of the busy anchorages near the creek Deshpande collected Early Historic Red Polished Ware sherds and stone beads from the mound which is enclosed by a later (colonial-period ?) fortification Subsequently. limited diggings at this site by the Maharashtra Archaeological Deptt revealed a 1 st- 2 nd century A.D. deposit yielding profuse amount of RPW (M.N.Deshpande personal communication) The site discovered by Deshpande may have served as one of the berthing stations on the Ulhas-Thane Creek waterway which made up the harbour of Kalliena Kalyana This anchorage can be approached by sea craft from the mouth of the Thane Creek near Vasai as well as from the sea-channel to the south and east of Mumbai where the island of Elephanta is situated (Fig. 32). The scatter of Early Historic habitation centres on the approaches to the sheltered River Ulhas-Thane Creek suggests that the port of Kalliena extended to include a number of trading stations in proximity Situated near the mouth of the Thane Creek is the Early Historic site at Vasai and the concentration of early Buddhist rock-cut caves on Salsette Island, the most important of them being the cave-group of Kanheri. On the southern side, the approach to Kalyana from the sea must have been dominated by Elephanta island where, as we shall discuss, material evidence of overseas trade contact occurs in profusion Coming back to Kanheri. The rock-cut monastic complex has been described by Mitra (1980:164) as 'the largest number of rock-cut caves straggling on a single hill' (PI. IV.a). We have reason to assume that the Buddhist retreat was also a base for maritime and commercial activity in the early centuries A.D. Excavations at Kanheri have brought to light evidence of iron manufacture in the form of furnaces, crucibles, slag and iron ore remains in early centuries A.D. levels (Indian Archaeology - A Review Luders 1969-70:21- 22). According to the excavator, S.R. Rao, the iron-making complex suggests that 'the large number of Buddhist monks living in the Kanheri caves did not confine themselves only to religious preachings but were also engaged in commercial activity' (Indian Archaeology - A Review Luders 1969-70:22). However Lohuizen De Leeuw (1973:258) is of the opinion that the Kanheri furnaces only served to produce iron for the monastery. A donative inscription at Kanheri containing the word Sagaravalokana has led Burgess (reprint 1970:83-84) to interpret the term as meaning of the people who protect the Ocean' or 'of the community of traders by sea.' Rao (1987:67) postulates that the word Sagaravalokana indicates the existence of a pilot-boat service in the Kanheri area. He further suggests that the caves may have also been
Warning! Page nr. 74 has not been proofread. Click the page link to verify the generated OCR text with the original PDF.
Vasai Kanheri Mumbai Kaliena Kalyana * Occupational Deposit +Rock Cut Caves Melisigara Ancient Placename Position of Mandagora : *P Elephanta Is. Arabian Sca 32 km or Distance between Semylla and Melizigara given 20 miles approx. by Ptolemy in the Geographia Chaul + Semila km Rajapuri Janjira IsLassen's position Melizigara Burgess and Dhavalikar's position. Kuda Mandad Mandagora -TransSavitri 50 Patel's position Schoff's and Casson's position Bankot Mandangarb Huntingford's position River Savitri Fig. 32. Important Ports on the Konkan Coast in Early Historic times.
Warning! Page nr. 75 has not been proofread. Click the page link to verify the generated OCR text with the original PDF.
194 a lighthouse. The Cape of Perimula mentioned by Pliny as the place where 'the greatest emporium of trade with India' as been associated by McCrindle (1926 145) with Salsette island on which Kanheri is situated. The fact that the maximum number of donors who have inscribed their names at Kanheri belong to Kalyana points to the integrity of ancient Kanheri-Kalyana Kalliena. The island of Elephanta, located south of Mumbai, seems to have been an Early Historic trading station engaged in overseas commerce. Prospections on the island have brought to light structures which may be remains of Early Historic berthing points. The discoveries have mainly centred about two locations at Elephanta, the village of Rajbandar on the south side and Morabandar village on the north-east shore of the island. At Rajbandar a brick wall uncovered by the Maharashtra Public Health Dept. was further excavated by ASI archaeologists who interpreted the structure as a jetty or wharf. Three habitational levels were found corresponding to phases of raising of the jetty/wharf The finding of Mediterranean amphorae sherds in the excavations indicates that the site was a trading station (Rao 1987:65-66). At Morabandar also Rao (1987:65-66) reports submerged structures and finds of Roman, Kshatrapa and Gupta coins. Recently, Tripathi (1993-68) found the whole slopy area between the high steep hill and the shore (at Morabandar) strewn with remains of brick-made houses, stone walls and other remains and a large number of potsherds' From this area he recovered, among other Early Historic ceramics such as the Red Polished Ware and Black and Red Ware, substantial quantities of amphora sherds Also, the variety of amphorae collected by him suggest that Morabandar may have been a transhipment point for Mediterranean wine. As we have discussed above, Elephanta has yielded some fragments of pottery (Black Ware and Green-glazed ware) which were importations from the Persian Gulf region. To recapitulate, we can say, on the basis of the correlation of textual, epigraphic, archaeological and geograhical data that ancient Kalliena Kalyana was a port-complex extending from the 'core' Ulhas-Thane Creek area towards Kanheri on its northern approach and Elephanta island to the south
Archaeologists from Stanford find an 8,000-year-old ‘goddess figurine’ in central Turkey
| 5 min readArts & Humanities
A team of archaeologists led by Ian Hodder of Stanford, has unearthed an 8,000-year-old figurine at Çatalhöyük.
A team of archaeologists led by Ian Hodder, professor of anthropology and of classics at Stanford, has unearthed an about 8,000-year-old figurine at Çatalhöyük, a Neolithic site in central Turkey. The figurine, wrought from recrystallized limestone between 6300 and 6000 B.C., is a rare find in a place where most previously discovered pieces are sculpted from clay and deformed over millennia in the soil.

This 8,000-year-old figurine is notable for its craftsmanship. Such detail is only possible with thin tools, like flint or obsidian, in the hands of a practiced artisan. (Image credit: Çatalhöyük Research Project)
Conventionally associated with fertility goddesses, this figurine is also thought to represent an elderly woman who had risen to prominence in Çatalhöyük’s famously egalitarian society.
Hodder, who oversees the Çatalhöyük Research Project, learned of the discovery earlier this year when he received a call from Arek Marciniak, a Polish archaeologist, whose team had been digging in the southern part of the site when they unearthed the figurine.
“I rushed up to find a group of Polish archaeologists staring down at this white shape that was beginning to appear in the soil,” recalled Hodder, who “realized immediately that it was a very special find.” Excavators had hollowed out a large dwelling, where its former occupants had deposited the figurine in platforms built atop earlier structures. At the platform’s far southeast corner, abutting the wall, the archaeologists found the figurine. Left of the first figurine lay an obsidian blade, and nearby sat another figurine of lesser quality, hewn from yellow limestone, next to a piece of galena. Hodder quickly summoned his team to the trench, where a photographer snapped photos and researchers made preliminary assessments.
The stone figurine measures 17 centimeters (6.7 inches) long and 10.96 centimeters (4.3 inches) wide, weighing in at 1 kilogram (2.2 pounds). Aside from oddly small hands and feet, it reflects “a good and pragmatic knowledge of the human body,” according to a report by Hodder’s team, whose members include Lynn Meskell, Stanford professor of anthropology, and Lindsay Der, who recently completed her PhD in anthropology at Stanford.
Well-crafted piece
What sets this figurine apart from so many others is not its appearance, but its craftsmanship. Goddess figurines at Catalhöyük usually depict a woman with her hair tied in a bun, plump, with sagging breasts and a pronounced belly, suggesting maturity.
The figurine in question contains a few unusual features: elaborate fat rolls on the limbs and neck; the arms separated from the torso; and an undercut below the belly to separate it from the rest of the body. Such detail is only possible with thin tools, like flint or obsidian, in the hands of a practiced artisan. Millennia of weathering in the soil has erased evidence of the figurine’s handling.
While of exceptional quality, this figurine was not of exceptional purpose. Goddess figurines were common in the Neolithic period, crafted throughout southeastern Europe, the Middle East and Anatolia, the region in central Turkey where Çatalhöyük once flourished. While they have long symbolized fertility, a more recent theory suggests otherwise.
Meskell is among a handful of scholars who posit that the Neolithic figures at Çatalhöyük may “represent older women who have achieved status.” Whether they rose to the level of goddesses, though, is unclear.
Ancient egalitarian society
Çatalhöyük’s reputation as a relatively egalitarian society may offer some clues into the figurine’s symbolism and use. “In all egalitarian societies, older people have a special status and are venerated,” said Hodder. In his account, “whether one can talk of these older people as ‘gods’ is a rather thorny issue.”
Gods or not, the elderly in Neolithic Çatalhöyük may have held elite status, performing rituals and making decisions that impacted the entire community. Fatness may have been a sign of social standing and of age, with calorie-burning manual labor replaced by sedentary religious and political duties.
But as a status symbol, the figurine might also signal a shift from a sharing to an exchange economy, where resources could be accumulated unevenly. In sharing economies like Neolithic Çatalhöyük, resources were often pooled, while later civilizations, most notoriously ancient Rome, favored exchange economies that led to vast social inequality.
“We think society was changing at this time, becoming relatively less egalitarian, with houses being more independent and more based on agricultural production,” Hodder said. The figurine, with its fine artistry, sat in the newer parts of the site. Its location near the surface means that it was buried later – that is, well after Çatalhöyük civilization had peaked, when fatness symbolized high status in a stratified society rather than an elevated place in a society of equals, he said.
Whatever form this metamorphosis may have taken, it did not happen overnight. Humans first settled in Çatalhöyük around 7500 B.C. in an area overlooking the Konya Plain, now in present-day Turkey. The settlement reached its peak around 7000 B.C. and was abandoned around 5700 BC.
The figurines produced in Çatalhöyük’s later years seem to have mediated between the living and the dead. Previous generations had buried human remains in platforms between levels in houses, with platforms connecting the living above and dead below. Houses were the bedrock of Çatalhöyük society, their beginnings and endings marked in deposition rituals. “In these latest levels of Çatalhöyük, burial of humans in the houses stops,” said Hodder, who surmised that “perhaps these figurines are replacements for that idea.”
Excavations at Çatalhöyük first began in 1961 under James Mellaart, a British archaeologist, whose digs continued through 1965. Though discontinued after the Turkish government banned Mellaart, the excavations revealed Çatalhöyük to be a large Neolithic settlement, with over a dozen layers of ruins coinciding with different stages of history.
The site remained untouched until 1993, when Hodder established the Çatalhöyük Research Project, an international group of archaeologists and specialists from over a dozen universities. Excavations in the ensuing years have enjoyed wide sponsorship, including the backing of the Turkish government. The Neolithic site of Çatalhöyük was designated a UNESCO World Heritage Site in 2012.
Related topics
Share this story
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:19 IST2025-11-18T13:16:50+5:302025-11-18T13:19:16+5:30
Thane Mental Hospital: ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दगड सापडले.

Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे:
इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या ठाण्याचे अस्तित्व दाखवून देत आहेत. शहर
स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने बदलत असताना, काळाच्या पडद्याआड गेलेल्या
वारशाच्या अनेक खुणा समोर येत आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाडकामात
पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दगड सापडल्याने ठाणेकरांत ऐतिहासिक उत्सुकता वाढली आहे.
नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अनेक जुन्या इमारती हटविण्यात येत आहेत. याच प्रक्रियेत अनेकवर्षे बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्याचे पाडकाम सुरू होते. पाडकामादरम्यान एक सुंदर कोरीव दगड प्रकाशात आला आणि कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. सुमारे अडीच ते तीन फूट उंच आणि सव्वा ते दीड फूट रुंद असलेल्या या दगडावर अत्यंत सूक्ष्म अशी कोरीवकाम केलेली शिल्पकला स्पष्ट दिसते. डोक्यावर पगडी घातलेले संत, त्यांच्या शेजारी उभा असलेला शिष्य आणि बाजूला उभी असलेली नर्तिका अशा तिन्ही प्रतिमा अतिशय प्राचीन कलाशैलीत साकारल्या आहेत.
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
यापूर्वीही दिसले ब्रिटिशकालीन दगड
रुग्णालय परिसरात यापूवीर्ही ब्रिटिशकालीन मुखवट्यांचे दगड बांधकाम पडताना दिसले. या जागेत अजूनही अनेक ऐतिहासिक अवशेष दडलेले असण्याची शक्यता अधिक बळावली आहे. शहराचा विकास आणि इतिहासाचा वारसा या दोन गोष्टींची सांगड घालून जुन्या वस्तूंचे जतन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
इतिहासाशी संबंधित कुठलीही नोंद नाही
प्राथमिक
अंदाजानुसार हा दगड अत्यंत प्राचीन असण्याचा अंदाज आहे. या परिसराच्या
इतिहासाशी संबंधित कोणतीही नोंद रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने, या
दगडाचा प्राचीन आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्याची
मागणी जोर धरत आहे. ठाणेकरांच्या मते, अशा मौल्यवान कलावस्तू आजच्या
विकासाच्या काळात सापडणे ही दुर्मीळ गोष्ट असून अशा शिल्पकलेचे जतन करणे
अत्यावश्यक आहे. यापूर्वी रुग्णालयाचे बांधकाम पाडताना प्राचीन दगड सापडले
होते. त्यामुळे या वास्तूचा प्राचीन काळाशी काही तरी संबंध असल्याचा अंदाज
व्यक्त होत आहे. मात्र याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे कुठलही नोंद नाही.
कल्याण शहराला खूप मोठी अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. असेच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले कल्याण मधील श्री त्रिविक्रम मंदिर. मंदिरातील विष्णू मूर्तीच्या हातात प्रदक्षिणा मार्गे, खालच्या उजव्या हातात पद्म, वरच्या उजव्या हातात गदा, वरच्या डाव्या हातात चक्र, खालच्या डाव्या हातात शंख आहे. अशा प्रकारे पद्म, गदा, चक्र, शंख असा क्रम आहे. म्हणून ही विष्णूच्या चोवीस मूर्ती पैकी "त्रिविक्रम" मूर्ती आहे. कल्याण येथील त्रिविक्रम मंदिरात विष्णूची सुंदर मूर्ती आहे, ज्याच्या बाजूला विष्णूचे दशावतार (मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, परशुराम, श्रीराम, कल्की, बलराम, बुद्ध) कोरलेले आहेत. मूर्तीच्या पायाजवळ जय-विजय द्वारपाल आहेत.
ही मूर्ती पेशव्यांचे कारभारी बळवंत मेहेंदळे यांनी 18 व्या शतकाच्या मध्यात गुजरात मोहिमेतून आणली होती. पालखीतून आणताना मूर्ती जड झाल्यामुळे ती मूळच्या शिव मंदिरात ठेवण्यात आली, आणि त्यानंतर तिची प्रतिष्ठापना करून त्रिविक्रम मंदिर बांधण्यात आले. मेहेंदळे यांनी 2 मंदिरे बांधली होती एक विष्णु मंदिर आणि एक शिव मंदिर आणि त्रिविक्रम मूर्ती ज्या मंदिरात आहे ते मूळ शिव मंदिर कारण आपणास बाहेर नंदी मुख पाहायला मिळते.
The ancient historical temple of Trivikram at Kalyan
The ancient historical temple of Trivikram
at Kalyan and the significance of Vaikunth Chaturdashi which binds Hindus

Temples of different Deities were built all over the world. Every seeker began praising his Deity of worship and sect and began spreading it. However in the process he began to look down upon seekers of other sects because of which animosity developed between Shaivas (devotees of Shiva) and Vaishnavs (devotees of Vishnu). Several Holy texts were compiled to wipe out these differences.
The Kalbhairav Varad stotra mentions the oneness of these Deities –
तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती । सामान्य मती । गुंग होऊन जातसे ॥६॥
गाणपत्य म्हणती गणपती । शक्ती म्हणती महाशक्ती । स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्री विष्णु ॥७॥
नाना देव देवता । प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता । आपापल्या परीने भक्ता । आकर्षूनी घेतसे ॥ ८॥
हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहूनी कनिष्ठ । हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडत असे ॥९॥
At times these differences led to riots. It was at this juncture that Jagadguru Shri Shankaracharya commenced the system of worshipping a family of five Deiites (panchayatan) and wiped out these differences and tried to create unity. Several such attempts were made by ancient Sages.
As is known that sanskars (subconscious impressions) lead to creation of virtues and decrease in defects, despite several invasions on the Sanatan Hindu culture it has still survived. This culture has studied lifestyles and made progress in the spheres of politics, Dharma, society and science. ‘Vaikunth Chaturdashi’ is one such great experiment arising from this.
Kartik Shuddha Chaturdashi is known as Vaikunth Chaturdashi and Pournima as Tripurari Pournima. These vowed religious observances (vrats) are more or less paired. Vishnu and Shiva are two different forms of the same Supreme Soul (Paramatma) created to perform different missions. It is sheer ignorance on our part which is causing us to view Them as different Deities and leading to sectarian differences.To alleviate this difference of opinion and to depict oneness between Vishnu and Shiva the above remedies have been devised by the Scriptures.The almanac (panchang) has recommended a fast for Vaikunth Chaturdashi, worship of Deity Vishnu beneath an amla/avli tree and ritualistic worship (puja) of Vishnu at midnight followed by that of Shiva at sunrise. Many perform the Vaikunth Chaturdashi vowed observance. The lamp to Vaikunth (abode of Shri Vishnu) is lit and at night the happiness of meeting both Hari and Har is experienced.
At the Trivikram temple on Vaikunth Chaturdashi it is customary to offer tulsi
(Holy basil) to Deity Shankar and bel (aegle marmelos) to Deity Vishnu.
During the reign of Saint Narahari there were no conflicts between the
Shaivas and Vaishnavs. It is there itself that Deity
Pandurang brought about a vision of the linga, a symbol of Deity Shiva.
On this linga Jagadguru Shri Shankaracharya wrote the Shri
Pandurangashtakam stotra.
Thatform of Shri Vishnu in the incarntion of Vaman which manifested
before King Bali is famous as Shri Trivikram. Shri Trivikram adorns the
linga on His head.
The historical town of Kalyan has a temple of Shri Trivikram which celebrates Vaikunth Chaturdashi with great fervour. This temple dates back to the Peshwa regime and the idol here was brought by Shrimant Balwantrao Mehandale serving the Peshwas, during his Gujarat campaign, in the 18 th century. The idol has been sculpted from gandaki (a type of marbale) marble and has an aura around itself. On either side of this aura are engraved the ten incarnations of Deity Vishnu along with Jai-Vijay the gatekeepers of Vaikunth and Rai-Rakhumai (Divine Energies of Vishnu). The idol has four arms adorning a lotus, discus, conch. Also as per tradition it adorns a linga on the head. As this idol is a union of Shibva and Vishnu devotees of all Deities get a simultaneous vision of them.
– Mr. Dinesh Deshmukh (Trustee)
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2015 रोजी प्रकाशित
प्राचीन कल्याणची खूण नवा विष्णू
शहरातील लोहाणा समाजातील रहिवाशांनी द्वारकाधीश म्हणून या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

कल्याणमधील पाचव्या शतकातील संस्कृतीचा पुरावा
प्राचीन
बंदर म्हणून अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून कलियान या नावाने सध्याच्या
कल्याणचे उल्लेख असले तरी आता शहरात तितके प्राचीन अवशेष फारसे आढळत नाहीत.
मात्र शहरातील नव्या विष्णू मंदिरात द्वारकाधीश नावाने पूजल्या जाणाऱ्या
मूर्तीच्या रूपाने कल्याणमध्ये पाचव्या शतकात नांदत असलेल्या संस्कृतीची एक
ठळक खूण सापडली आहे. इतिहासतज्ज्ञांनी निरीक्षण करून ही मूर्ती पाचव्या
शतकातील असल्याचा निर्वाळा दिला आहे.
कल्याणच्या लेंडी तलावात १२०
वर्षांपूर्वी ही विष्णू मूर्ती सापडली. शहरात पेशवेकालीन विष्णू मंदिर आहे.
त्यामुळे नव्याने सापडलेली मूर्ती म्हणून याला ‘नवा विष्णू’ हे नाव पडले.
शहरातील लोहाणा समाजातील रहिवाशांनी द्वारकाधीश म्हणून या मूर्तीची
प्रतिष्ठापना केली. अत्रे नाटय़गृहापासून हाकेच्या अंतरावर दूधनाक्याकडे
जाणाऱ्या रस्त्यावर हे नवे विष्णू मंदिर आहे. पुढे नागरीकरणाच्या रेटय़ात
लेंडी तलावही बुजविला गेला. त्या ठिकाणी आता सुभाष मैदान आहे.
दरम्यान
कल्याणमधील पारनाका येथे राहणाऱ्या चिंतामणी फडके यांच्या घरात पिढीजात
पूजेच्या साधनांमध्ये असलेला शंख प्राचीन असल्याचे आढळून आले. तो शंख पाहून
परिसरात प्राचीन विष्णू मूर्ती असावी, असा अंदाज याच परिसरात राहणारे
ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी वर्तविला. त्या
दृष्टीने त्यांनी शोधही सुरू केला. त्यातूनच नवा विष्णू म्हणून पूजल्या
जाणाऱ्या द्वारकाधीशाच्या मूर्तीचे निरीक्षण करण्यात आले. सहा फुटी या
पूर्णाकृती मूर्तीच्या एका हातात शंख, तर दुसऱ्या हातात गदा आहे. एका हात
विठ्ठलासारखा कंबरेवर आहे.
कल्याणमधील ही मूर्ती पाचव्या शतकातील आहे. पनवेल तसेच
घारापुरी येथे पाचव्या शतकातील अशा प्रकारच्या मूर्ती मिळाल्या आहेत.
मात्र त्या खंडित स्वरूपाच्या आहेत. कल्याणमधील मूर्ती मात्र अखंड आहे.
महाराष्ट्रात पूजली जाणारी ही सर्वात प्राचीन विष्णू मूर्ती आहे.
पुरातत्त्व संशोधक डॉ. अरविंद जामखेडकर आणि ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ सदाशिव
गोरक्षकर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
– डॉ. अरुणचंद्र पाठक, प्राच्यविद्या संशोधक
कल्याण या ठिकाणाला खूप मोठा असा इतिहास आहे. कल्याण मध्ये आपल्याला खूप सारी जुनी मंदिरे पाहायला मिळतात. कल्याणमधील श्री नाकोडा पार्श्व भैरव जैन मंदिरात असलेली ही विष्णू मूर्ती समपाद उभी आहे. ही मूर्ती पूर्वी लेंडी तलावात सापडली होती. तलावाच्या परिसरात गुजराती समाजाने विष्णू मंदिर उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सध्या या मूर्तीला द्वारकाधीशाप्रमाणे सजवले जाते.
मूर्ती चतुर्भुज असून उजव्या पुढचा हात अभय मुद्रेत आहे, मागच्या हातात गदा आणि चक्र, तर पुढचा डावा हात जो कमरेजवळ आहे त्या हातात शंख आहे.मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूस खाली अनुक्रमे गदा व शंखातून प्रगट झालेली गदादेवी व शंखपुरुष दाखविले आहे. डोक्यावर किरीट मुकुट असून चेहऱ्याभोवती प्रभावळ आहे. गळ्यात एकावली आणि हातात बाजूबंद अलंकार आहेत.
ही मूर्ती पूर्वी लेंडी तलावात सापडली होती. तलावाच्या परिसरात गुजराती समाजाने विष्णू मंदिर उभारून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सध्या या मूर्तीला द्वारकाधीशाप्रमाणे सजवले जाते. तुम्हाला मूळ मूर्ती जर पहायची असेल तर तुम्हाला सकाळी लवकर या मंदिरात जा कारण जेव्हा मंदिरातील पुजारी जेव्हा मूर्ती वरील सोवळे काढतात तेव्हा मूळ मूर्ती पाहायला मिळते.
Tisai Temple Tisgaon, Kalyan, Dist. Thane – Pilgrim Data Services
जरीमरी / तिसाई मंदिर
तिसगाव, ता. कल्याण, जि. ठाणे

कल्याणमधील तिसगाव येथील प्राचीन मंदिरातील जरी आणि मरी या स्वयंभू देवी आगरी–कोळी बांधवांच्या आराध्यदेवता आहेत. जरी आणि मरी या मूळच्या उग्र प्रवृत्तीच्या देवता आहेत. गावावरील रोगराईचे अरिष्ट दूर करणाऱ्या देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. येथील जरीमरी मंदिराला तिसाई मंदिर असेही म्हटले जाते. भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या देवी अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे चैत्र पोर्णिमेला भरणाऱ्या जत्रेदरम्यान ठाणे जिल्ह्याबरोबरच रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, धुळे आदी भागांतून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून जातो.
मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, मरीआई आणि जरीआई या देवी रोगांशी निगडित आहेत. पूर्वी प्राणघातक असलेल्या साथीच्या रोगांच्या देवी कल्पून त्यांची पूजा केली जात असे. यातील मरी ही पटकी व देवी यांसारख्या रोगांच्या साथीची देवी आहे, तर जरी ही तापाच्या साथीची देवी आहे. या जरीमरीचे स्थान गावामध्ये एका कोपऱ्यात किंवा गावाबाहेरील झाडाखाली असते.
तिच्या पुजाऱ्यास पोतराज वा पोतुराजा असे संबोधतात. ते मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन गावोगाव फिरताना दिसतात. लोकसमजुतीनुसार, पोतराज या मरीआईच्या भगताच्या मार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते. या पोतराजास काही ठिकाणी कडकलक्ष्मी असेही म्हणतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की जरी–मरीआईच्या कोपामुळे या रोगांच्या साथी येतात. त्यांना संतुष्ट केल्यास रोगराईचे संकट टळते.
तिसगाव येथील या मंदिराची आख्यायिका अशी की सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी या परिसरात जंगल होते. येथील टेकडीवर लोक गायी–गुरांना चरण्यासाठी आणत. एका दिवशी येथील गणा गायकवाड नावाची व्यक्ती गुरांना घेऊन टेकडीवर गेली असता, अचानक सोसाट्याचा वारा सुटला. या वाऱ्याबरोबर त्याच्या कानी देवींचा आवाज पडला. ‘आम्ही येथील तलावात पाषाणाच्या रूपात आहोत. आम्हाला तलावातून बाहेर काढून स्थापना कर’, असे देवींनी त्याला सांगितले. गणाने गावात येऊन काही जाणत्या लोकांच्या कानावर ही घटना घातली. दुसऱ्या दिवशी सर्व जण तलावाजवळ आले. त्यानंतर गणाने तलावात बुडी मारून मूर्तींचा शोध घेतला. काही वेळाने तो मूर्ती हातात घेऊन बाहेर आला. त्यानंतर एका शुभमुहूर्तावर ग्रामस्थांनी तलावासमोरील पिंपळाच्या झाडाखाली छोटे कौलारू मंदिर बांधून त्यात देवींची प्रतिष्ठापना केली. कालांतराने सध्या मंदिर असलेल्या ठिकाणी या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९५६ मध्ये मंदिराचे तत्कालीन मुख्य विश्वस्त माधवराव उर्फ बापूसाहेब ओक यांच्या प्रयत्नातून ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचा द्वितीय जीर्णोद्धार करण्यात आला. १९९६ मध्ये मंदिराचा तिसरा जीर्णोद्धार झाला. त्यादरम्यान मंदिराचे संगमरवरीकरण तसेच गर्भगृहाचे सुशोभीकरण करण्यात आले. २०११ मध्ये येथे मूर्तींचे वज्रलेपन, पुनःप्रतिष्ठापना तसेच ध्वजारोहण सोहळा झाला.
या मंदिराच्या साक्षीने कल्याण आणि वसईच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडल्याची नोंद आहे. ‘सुभे कल्याण’ (विवेकानंद गोडबोले, इतिहास संशोधन मंडळ कल्याण, १९७४) या पुस्तकानुसार, पेशवाईतील सरदार गंगाजी नाईक अणजूरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे पेशव्यांनी पोर्तुगिजांविरोधातील वसईची मोहीम आखली. श्रीमंत चिमाजी अप्पा हे या मोहिमेवर निघाले. त्याची नांदी या मंदिराच्या पटांगणात झाली. त्यावेळी सरदार अणजूरकर यांनी कल्याणला येऊन भवानीचा गोंधळ घालण्याच्या निमित्ताने नामाजी देशमुख, भिकाजी हैबतराव आदी मंडळींना येथे पाचारण केले व त्यांना मोहिमेची कामे नेमून दिली. कल्याणमधील तिसगाव नाक्यावर असलेल्या मंदिराच्या कमानीपासून चालत काही अंतरावर आल्यानंतर डाव्या हाताला हे मंदिर लागते. मंदिराच्या शिखरांवर आकर्षक नक्षीकाम आहे. देवींच्या मूर्ती सापडलेला तलाव मंदिराच्या समोरच आहे. या तलावाचे २००६ मध्ये नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. या तलावाच्या मध्यभागी कमळावर बसलेल्या देवींच्या मूर्ती आहेत. या कमळाभोवती सोंड उंचावलेल्या
पाच हत्तींची शिल्पे आहेत.
तलावासमोरील पिंपळाजवळ सात आसरा देवींचे तांदळे आहेत. आसरा हा अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्या जलदेवता असतात. त्या नेहमी सातच्या संख्येने एकत्र असतात म्हणून त्यांना सात वा साती आसरा असे म्हणतात. मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा व मकरी अशी त्यांची नावे होत. ‘द फोकलोअर ऑफ बॉम्बे’ आर. ई. एन्थोव्हेन यांच्या १९२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनपर ग्रंथात अशी माहिती देण्यात आली आहे की आसरांना काही भागात मावलाया असेही म्हणतात. ठाणे जिल्ह्यातील लोकसमजुतीनुसार सर्व जलसाठ्यांनजीक सात आसरांचे वास्तव्य असते. काहींच्या मते, ज्या तलावात कमळे असतात तेथेच त्या राहतात. या आसरा मुले आणि आणि तरूणींना त्रास देतात. साती आसरांच्या तांदळ्यांच्या जवळच छोटी गणेशमूर्ती आहे. येथे पुष्पहार व प्रसादाची दुकाने आहेत. समोरच आकर्षक बांधकाम असलेले संगमरवरी जरीमरी अर्थात तिसाई मंदिर आहे. मंदिरासमोर मोकळे प्रांगण आहे. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात मंदिराच्या समोर खांमदेवाचे (खांबदेवाचे) स्थान आहे.
येथे या देवाचा खांब आहे व त्याला सोन्याचा गिलावा असलेला पत्रा चढवण्यात आला आहे. यात्रेदरम्यान येथे कोंबड्या–बकऱ्यांच्या बळीच्या रूपात देवींचा मान दिला जातो.
दर्शनमंडप, सभामंडप, गर्भगृह व प्रदक्षिणा मार्ग असे तिसाई मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपात भाविकांना बसण्यासाठी लोखंडी बाकडे आहेत. सभामंडपाच्या भिंतींच्या दोन्ही बाजूंना देवळ्या आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मध्यभागी कीर्तीमुख कोरलेले आहे. सभामंडपात जाळ्या असलेल्या खिडक्यांमुळे येथे पुरेसा प्रकाश व खेळती हवा असते. सभामंडपाच्या मध्यभागी गर्भगृह आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या खाली मध्यभागी कीर्तिमुख आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती आहे. त्यावरच्या भागात कलश आहे. प्रवेशद्वाराच्या खांबांच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. गर्भगृहात मूळच्या चांदीच्या नक्षीदार मखरास सोनेरी रंगाचा मुलामा चढवण्यात आला आहे.
त्यावर वेलबुट्ट्यांची नक्षी व मध्यभागी कीर्तीमुख आहे. मखरातील नक्षीदार प्रभावळीवर कळस कोरण्यात आलेला आहे. मखराच्या वरच्या कोपऱ्यांवर सूर्य–चंद्र आहेत. मखरात मध्यभागी जरी–मरी यांच्या शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहेत. मूळच्या पाषाणी मूर्तींवर मुखवटा चढवण्यात आला आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहाला लागून असलेल्या उजवीकडील भिंतीत कोरलेल्या हत्तीच्या सोंडेतून मूर्तींवरील अभिषेकजल सोडण्यात येते.
गर्भगृहालगतच डाव्या बाजूला राम मंदिर आहे. मंदिरात श्रीराम–सीता–लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत. त्यासमोर नमस्कारमुद्रेत बसलेल्या हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तींच्या डावीकडे एका चौथऱ्यावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. तिसाई मंदिरात जानेवारी महिन्यात चंडियाग तेजोत्पत्ती तसेच पुनःप्रतिष्ठापन यांचा वर्धापन दिन सोहळा होतो. याच महिन्यात उरणनजीकच्या करंजे येथून येथे तिसाई देवीची पालखी येते. येथे माघी गणेशोत्सव, महाशिवरात्री, रामनवमी, गुरुपोर्णिमा, नारळी पोर्णिमा, नवरात्रोत्सव, दीपावली आदी सण–उत्सव साजरे होतात. जून महिन्यात होणाऱ्या गावच्या ‘साथ’ या कार्यक्रमात देवींना गोड नैवद्य दाखवला जातो. यावेळी देवींचा मानपान तसेच प्रसाद वाटपही होते. नवरात्रोत्सवात घटस्थापना, कीर्तन, होम–हवन, घट उत्थापन तसेच विजयादशमी सोहळा होतो.
चैत्र पोर्णिमेला परिसरात देवीची दोन दिवसांची मोठी जत्रा भरते. पोर्णिमेला पहाटे देवींना अभिषेक–पूजा केली जाते. त्यानंतर देवींचा शृंगार केला जातो. गर्भगृहात फुलांची आरास केली जाते. देवीची पालखी सायंकाळी गावातून फिरते. या पालखीचा मान भोई समाजाकडे आहे. वाटेत पालखी एका शिळेजवळ विश्रांतीसाठी थांबवण्यात येते. या ठिकाणी आता तुळशीवृंदावन बांधण्यात आले आहे. पालखी मंदिराजवळ आल्यावर मंदिर परिसराला पालखीच्या पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी विसर्जित होते. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा मिरवणूक सोहळा सुरू असतो. यात्रेदरम्यान देवींचे मानपान करण्यात येते. येथे पूर्वी देवींना कोंबड्या–बकऱ्यांचे नैवद्य दिले जात असत. मात्र काही वर्षांपासून देवींना वालाचे बिरडे किंवा उसळ तसेच गोडधोड पदार्थांचा शाकाहारी नैवद्य दाखवण्यात येतो. भाजलेल्या तांदळाच्या पीठाच्या (भुज्याचे पीठ) लाडूंचा नैवद्यही दाखवला जातो. मात्र मंदिराच्या पूर्वेस असलेल्या खांमदेवाच्या स्थानी नवस केलेले कोंबड्या, बकरे, मेंढे यांचे बळी दिले जातात.
यात्रेदरम्यान परिसरात पाऊल ठेवायलाही जागा नसते. तिसगाव नाका ते मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा खेळणी, प्रसाद, मिठाई, विविध वस्तूंची विविध दुकाने, आकाशपाळणे वगैरे लागलेले असतात. यात्रेदरम्यान परिसरात कुस्त्यांचे जंगी सामनेही होतात. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणचे मल्ल त्यात भाग घेतात. या यात्रेसाठी लांबून येणाऱ्या भाविकांसाठी कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या परिहवन उपक्रमातर्फे विशेष बसेसही सोडण्यात येतात.
उपयुक्त माहिती
- कल्याण रेल्वे स्थानकापासून सुमारे ४ किमी,
- तर ठाणे शहरापासून ३३ किमी अंतरावर
- कल्याणपासून महापालिका परिवहन बस व खासगी वाहनांची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
कल्याण: नवसाला पावणारी ‘तिसाई देवी’ म्हणजेच ‘जरीमरी माता’

कल्याण : भाग्यश्री प्रधान आचार्य: आदिशक्ती आदिमायेचं एक रूप म्हणजे कल्याण येथील तिसाई देवी. याच देवीला जरीमरी माता म्हणून संबोधले जाते. अनेक भक्तांचे गाऱ्हाणे आपल्या पदरी घेऊन भक्तांच्या पाठीशी उभी राहून काट्याकुट्यातून चालणाऱ्या भक्तांच्या मार्गात गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालणारी आणि योग्य मार्ग दाखवणारी ही तिसाई देवी. मुंबईपासून ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्हयात तिसगाव नावाचे लहानसे खेडे आहे. त्या गावात तिसाई जरीमरी आईचे मंदिर असून त्यास सुमारे २०० वर्षांचा इतिहास आहे.
तिसगावातील गणा गायकवाड नावाचा एक सज्जन ग्रामस्थ आपल्या सवंगडयांसह नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गावाजवळील टेकडीवर गेला होता. यावेळी अचानक वादळ सुटले. सर्व गुरे व गुराखी एकत्र जमा झाले. सोसाटयाच्या वा-याबरोबर गणाच्या कानावर ध्वनीचा निनाद झाला. "गणा मी देवी आदिमाया शक्ती तुझ्याशी बोलत आहे, मी गावाजवळील तळयाच्या मध्यभागी पाषाण स्वरुपात आहे. मला वर काढ व माझी स्थापना कर. साधाभोळा गणा, त्यास काही समजेना, त्याने आपल्या सवंगडयांना ही गोष्ट सांगितली. सर्वांनी मिळून गावात जाऊन ही घटना गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सांगितली. या विषयावर गावक-यांची बैठक होऊन गणा म्हणतोय तर शोध घेण्यास काहीच हरकत नाही, असे ठरले.
मोठया उत्साहाने दुस-या दिवशी सर्व ग्रामस्थ गावाजवळील तळयात देवीचा शोध घेण्यासाठी उतरले. वादळांत ऐकलेले शब्द पुन्हा पुन्हा गणाच्या कानावर आदळत होते. झोपेत चालणा-या माणसांप्रमाणे गणा चालत होता. व तळयाच्या मध्यभागी जाऊन त्याने तलावात बुडी मारली, गणा पाण्यातून वर आला तो पाषाण स्वरुपातील देवीची मूर्ती घेऊनच. मूर्ती पाहून सर्वच गावक-यांना आश्चर्य वाटले. व आनंद झाला. त्यांच्या तोंडातून उस्फूर्तपणे देवीच्या नावाचा जयजयकार झाला. आजूबाजूस सर्व खारे पाणी असताना ज्या ठिकाणी देवीची मूर्ती सापडली. त्या ठिकाणचे पाणी मात्र गोड आहे. व ही परिस्थिती आजही तशीच आहे. सर्व गावकऱ्यांनी विचार करुन एका शुभदिनी देवीची स्थापना केली. व एक लहानसे कौलारु मंदिर उभारले. त्या दिवसांपासून गणा गायकवाड गणा भगत म्हणून प्रसिध्दीस आला.
देवीचा महिमा सर्वदूर पसरला
हळूहळू जरीमरी देवस्थानाचा महिमा सर्वदूर पसरु लागला. मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, पुणे एवढेच काय इतर राज्यातूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी तिसगावात येऊ लागले. भक्तिभावाने आपली गा-हाणी देवीला सांगू लागले. देवीही नवसाला पावू लागली. तिसाची आई जरीमरी माता नवसाला पावणारी व संकटकाळी धावून येणारी भक्तांचे श्रध्दास्थान बनली.
देवीचा पुजारी निवडतानाही देवी देते कौल
निसर्ग नियमाप्रमाणे गणा भगत यांचा मृत्यू झाला. व गावक-यांपुढे देवीचा नवीन पुजारी कोणाला ठेवावा, हे ठरविणे अवघड होऊन गेले. एकाएकी चमत्कार झाला. राघो गायकवाड नावाचा तिसगाव पाडयावर राहणारा तिसगावचा रहिवाशी ग्रामस्थांकडे आला. त्याने सांगितले की "माझ्या शरीरामध्ये देवीचा संचार झाला असून मला देवीने भगत म्हणून राहण्याची आज्ञा केली आहे". यावर ग्रामस्थांनी अविश्वास व्यक्त करुन त्याची परीक्षा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी पंच मंडळींची नियुक्ती करण्यात आली. पंचांनी एक योजना तयार केली. गावांतील सर्व मंडळी रात्री ७ वाजता तिसगाव येथील बाळाराम अर्जुन गायकवाड यांच्या घरासमोरील तुळशी वृंदावनाजवळ एकत्र जमली.
त्या ठिकाणी राघो गायकवाड याला बोलविण्यात आले. पंच मंडळींनी अगोदरच पाच रंगाची फुले त्याठिकाणी आणून ठेवली होती. ती फुले सर्वासमोर पंच मंडळींनी बाजूला नेली. व आपआपसांमध्ये ठरवून त्यातील एक फूल कोणासही न सांगता निश्चित केले. ही पाचही फुले राघो गायकवाड याचे समोर ठेवून त्यास सांगितले की, "आम्ही या पाच फुलांपैकी एक फूल तू भगत असल्याची निशाणी म्हणून ठेवले आहे. जर तू ते फूल अचूक उचललेस. तर आम्ही तुझा भगत म्हणून स्वीकार करु'. त्यानंतर राघो गायकवाड याने डोळे मिटून देवीचे स्मरण केले. अंगात एखादया अद्भुत शक्तीचा संचार झाल्याप्रमाणे तो थरथरु लागला. व जरीमरी मातेचा जयजयकार करीत त्याने एक फूल उचलून पंच मंडळींच्या हातात दिले. पंच मंडळींनी निश्चित केलेले तेच फूल होते. राघो भगतबरोबरच रामा भगत नंतर पांडू भगत व धर्मा भगत बेंमट्या भगत हे देवीचे भगत झाले. आता वसंत भगत ही सेवा करत आहेत.
कल्याण शहराच्या इतिहासातील एक मोठा ऐतिहासिक ठेवा मानावा लागेल अशी ५-६व्या शतकातील विष्णूमूर्ती नुकतीच उजेडात आलेली आहे. आजवर द्वारकाधीश म्हणून पूजली जाणारी ही मूर्ती प्रत्यक्षात महाराष्ट्रातील पूजेत असलेली एकमेव प्राचीन विष्णूमूर्ती आहे.
कल्याण शहराच्या इतिहासातील एक मोठा ऐतिहासिक ठेवा मानावा लागेल अशी ५-६व्या शतकातील विष्णूमूर्ती नुकतीच उजेडात आलेली आहे. आजवर द्वारकाधीश म्हणून पूजली जाणारी ही मूर्ती प्रत्यक्षात महाराष्ट्रातील पूजेत असलेली एकमेव प्राचीन विष्णूमूर्ती आहे.
कल्याण (जि. ठाणे) प्रारंभिक ऐतिहासिक काळापासूनचे एक प्रसिद्ध बंदर. अरबी समुद्रास मिळणाऱ्या उल्हास नदीच्या काठावर, खाडीलगत असलेले एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून याला कुषाण–सातवाहन काळात महत्त्व होते. कल्याण (कलिअण), चोल, सोपारा, भडोच या सागरतरीय बंदरांच्या बरोबर दख्खन पठारावरील पैठण (प्रतिष्ठान), नेवासा (निधी निवास), तेर (तगर), भोकरदन (भोगवर्धन), नाशिक (नासिक्य) या तत्कालीन शहरांच्या बरोबर या स्थानाचा संपर्क होता. अगदी रोमपर्यंत सुरू असणाऱ्या व्यापारी मार्गाशी संबंधित असलेले हे स्थान एक संपन्न नगर होते.
सातवाहन नृपती गौतमीपुत्र सातकर्णी याच्या शासन काळात कल्याणचा रहिवासी आनंदपुत्र उपासक अपरेणू याने कान्हेरी येथे लेणी व मंडप दान दिल्याचा शिलालेख उपलब्ध आहे. कान्हेरी व जुन्नर येथील शिलालेखातून हे स्पष्ट होते की, कल्याण येथील संपन्न व्यापारी मोठ्या प्रमाणात दानधर्म करत. वेणहुनंदि व विष्णूनंदी (पिता) यांच्या कुटुंबीयांनी अशीच एक देणगी दिली आहे. व्यापाऱ्यांच्या विविध श्रेणी असत. कल्याणचा सुवर्णकार ‘स्वामीदत्त’ (‘शिवमित्र’) हा श्रेष्ठी आपल्या कुटुंबीयांसह चतुःदिशेच्या भिक्षुसंघासाठी दान देतो. हे दान स्तुप, चैत्य या परिसरातील जलकुंड, बसण्यासाठीचे बाक, पथ (चकम-चकम) यांच्या निर्मितीसाठी दानं दिले आहे. शिवाय कल्याणलगत असलेल्या गंधारिका (गांधारी) भूमीतील निवास व भोजन चतुःशाला यांसाठीही दान दिल्याची नोंद मिळते. या नोंदीतून कल्याण शहराचे वैभव व परिसराची संपन्नता स्पष्ट होते. सातवाहन क्षत्रप काळात असलेला बौद्ध धर्माचा प्रभाव शीलाहार काळापर्यंत कायम होता. असे असले तरी सातवाहन काळातच वैदिक धर्मालाही मोठा राजश्रय प्राप्त झाला, हे नाणेघाट येथील अभिलेखातून स्पष्ट होते. उत्तरेत कुषाण, शुंग आणि सातवाहनानंतर कल्चुरी व विशेषतः त्रैकुटक राजवंशातील ताम्रशासनातून तत्कालीन शासकांनी महाराज, देहसेन व व्याघ्रसेन यांनी स्वतःला ‘परमवैष्णव’ मानल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर ‘कल्याण’ येथे आज ‘नवाविष्णूमंदिर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बाजारपेठेतील विष्णूमूर्तीचा विशेषत्वाने उल्लेख करीत आहे. ही विष्णूमूर्ती सध्या द्वारकाधिशाच्या स्वरूपात सजवली जाते.
नवा-श्रीविष्णू मंदिर -
कल्याण येथे सातवाहन काळात व नंतरच्या काळात झालेल्या वसाहतीचे अभिलेखीय पुरावे कान्हेरी लेण्यात मिळतात. तर पुरातत्वीयदृष्ट्या तत्कालीन मृद-भांडी गांधारी परिसरात मिळाल्याची नोंद एम. एन. देशपांडे यांनी केली आहे. असे असले तरी, अन्य कुठलाही ठळक पुरावा उपलब्ध झालेला नव्हता. येथील वसाहतीकरणाचे वैशिष्ट्य म्हणून येथे असलेल्या विविध जलाशयांची नोंद करावी लागते. यापैकी काळाच्या ओघात काळा तलाव वगळता शेणाळे तलाव, दुर्गाडी किल्ल्यालगतचा जलाशय व सुभाष मैदानाच्या जागी असलेला जलाशय पूर्ण नष्ट झाला आहे. सुभाष मैदानाच्या ठिकाणी पूर्वी लेंडी तलाव नावाचा जलाशय होता. याच जलाशयात विष्णूमूर्ती उपलब्ध झाली. साधारण १२० वर्षांपूर्वी जलाशयातून ही मूर्ती बाहेर काढण्यात आली व येथील प्रतिष्ठित गुजराती समूहाने (पुष्ठीपंथी लोहाणा समाज) जलाशयाच्या परिसरात नवाविष्णू मंदिराची निर्मिती करून विष्णूमूर्तीची प्रतिष्ठापना केली. आज नित्य पूजेत असलेली ही मूर्ती ज्या स्थानात मिळाली तेथे मूळ स्थानाची स्मृती म्हणून एक पादुका असलेला चौथरा व लहानशी खोली बांधली आहे. या ठिकाणी पूर्वीपासून असलेला वटवृक्ष श्रद्धेय मानला जातो. या मंदिरातील प्रभुश्री द्वारिकाधिशाचा शताब्दी महोत्सव संवत २०५३ वैशाख वद्य ८ गुरुवार दिनांक २९ मे १९९७ रोजी साजरा करण्यात आला.
विष्णूची स्थानक मूर्ती
द्वारकाधिश्वराचे मुख्य मंदिर द्वारकेला आहे. या मंदिर व मूर्तीचे विशेष महत्त्व आहे. तर डाकोरा (गुजरात) व काकरोळी (राजस्थान) येथेही द्वारकाधिश्वराचे मंदिर आहे. कल्याण येथील मंदिरातील मूर्ती स्थानकमूर्ती असून समपाद उभी आहे. ही पूर्णाकार मूर्ती (१५५ X ७० X २५ सेमी) आहे. मूर्ती चतुर्भुज असून दक्षिणकरक्रमाने चक्र, शंख, अभयहस्ता व गदाधारी आहे. मुळात ती उर्ध्वबाहू आहे. मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूस अनुक्रमे गदा व शंखातून प्रगट झालेली गदादेवी व शंखपुरुष दाखविले आहे. सदर मूर्तीचा गोलाईयुक्त चेहरा, स्मितहास्य (लहान जिव्हणी), सरळ नासिका, अर्धोन्मीलित नेत्र, डोक्यावर उंच टोपीच्या आकाराचा मुकुट ही वैशिष्ट्यं आहेत. या शिरोभूषणावर एकावर एक कोरलेली तीन पदके आहेत. मुख्य पदकावर त्रिरत्नचिन्ह अलंकृत असून माणिक-मोती व रत्नजडावाचे काम आहे व शेवटी लोलकाची झालर आहे. याला रत्नमुकुटही म्हणतात. चेहऱ्याभोवती प्रभावळ आहे. गळ्यात एकावली, हाती मनगटी व बाजूबंद, पायात तोडे असे किमान अलंकार धारण केले आहेत.
गदादेवी त्रिभंगात उभी आहे. उजवा हात लोलकहस्ता मुद्रेत असून डाव्या खांद्यावरील वस्त्र सावरणारा हात करतरी मुद्रेत आहे. केसांचा अंबाडा असून त्यावर शिरोभूषण धारण केले आहे. कानात मोठाल्या बाळ्या असून गळ्यात कंठी, मनगटी व बाजूबंद, पायात पैंजण आहेत. अधोवस्त्राचा सोगा दोन्ही पायात रुळतो आहे. तर शंखपुरुषाचा गोलाईयुक्त चेहरा, ठेंगणा बांधा, खांद्याखाली रुळणारे कुरळे केस व शिरोभूषण, दंडास स्पर्श करणारी हाताची घडी, गुडघ्यापर्यंत घसरलेल्या नेसूच्या वस्त्राचा दोन्ही पायात रुळणारा सोगा ही वैशिष्ट्यं आहेत. यावरून ही मूर्ती कुषाण काळानंतरची व गुप्त काळानंतर विकसित होत जाणाऱ्या मूर्तीपूर्वीची आहे. गदादेवी व हाती असलेली गदा या संदर्भात सांगायचे तर, विष्णूमूर्तीच्या हाती असलेली गदा ‘कौमोदकी’ या नावाने ओळखली जाते व दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र असून विष्णूचा शंख हा ‘पांचजन्य’ शंख असतो. या मूर्तीच्या हाती असलेली गदा कुषाणकालीन गदेसारखी - मुदगलासारखी दिसत नाही, तर ती विकसित झालेल्या गदेसारखी आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे मूर्तीच्या विकासक्रमातील एक महत्त्वपूर्ण अशी ही विष्णूमूर्ती ५-६व्या शतकातील विशेषतः ५५०च्या सुमारातील आहे. या संदर्भात डॉ. अ. प्र. जामखेडकर यांच्या मते ही कल्चुरी-कला शैलीचे प्रतिनिधित्व करणारी मूर्ती आहे. भाविकांनी श्रद्धेने जतन केलेले हे मूर्तीशिल्प कल्याण शहराच्या इतिहासातील एक मोठा ऐतिहासिक ठेवा मानावा लागेल. आजपर्यंत या संदर्भात स्पष्ट नोंद प्रथमच होत आहे. कल्याणमध्ये अचानकपणे लक्षात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शंखानंतर मी कल्याण शहरातील सर्व मंदिर शिल्पांची नव्याने पाहणी केली व ही विष्णूमूर्ती लक्षात आली.
वैशिष्ट्यपूर्ण शंख
कल्याण येथील साईधाम मंदिरात गेल्या चार पिढ्या असलेला हा शंख प्रथम पांडुरंग बलकवडे यांच्या लक्षात मार्च २०१३ मध्ये आला व त्यावर श्रीकांत प्रधान यांनी काम केले. हा शंख १७ सेमी लांब व १० सेमी उंचीचा आहे. या शंखावरील शिल्पकामाचा व्यवस्थित परिचय व्हावा यासाठी आरेखन व छायाचित्रण केले आहेत. त्यावर असलेला अनुक्रम (Alphabet) पुढे दर्शवला आहे. शंखावर कोरीव कामाचे प्रमुख चार पट आहेत. प्रारंभी (F), मगरमुखाच्या तोंडातून सुरू होणारा नक्षीचा पट आहे (E). मगरमुखातून विद्याधर बाहेर पडताना दाखविला आहे. त्यापुढे सुखासनात असलेले एक युगल आहे. यातील स्त्री एक हात जमिनीवर टेकून ती आपल्या स्वामीकडून काही ऐकत आहे. दुसरे एक जोडपे आहे व ह्या दोन जोडप्यांच्या मध्ये एक सेवक प्रथम प्रमुख प्रतिष्ठितांकडे लक्ष देत आहे (हा शिल्पपट २४ X ३ सेमी आकारात आहे). त्यानंतर (B) भौमितिक नक्षी असलेले दोन नक्षीपट आहे. (A) व त्याखाली अकरा हत्तींची रांग आहे. नंतर (C) एक युद्धप्रसंग दाखवला असून धावणारी व्यक्ती, त्यामागे धावणारे दोन वाघ, मध्ये हाती तलवार असलेला योद्धा व वाघांच्या विरुद्ध दिशेने धावणारा घोडेस्वार, त्यानंतर दोन हत्ती दाखवले आहेत. येथे एक मशाल व त्वेषाने भाला फेकणारा योद्धा दिसतो व त्यानंतर पुन्हा एक घोडेस्वार आहे (ह्या शिल्पपटाचा आकार ३३X३ सेमी आहे). या युद्धप्रसंगात असलेले चित्रण हे अजिंठा व कान्हेरी लेण्यातील शिल्पशैलीला जवळचे असून ५व्या शतकातील असावे. युद्ध प्रसंगातील मधले दृश्य फारसे स्पष्ट होत नसले तरी हत्तीच्या लगत भाला फेकणाऱ्या योद्ध्यासारखे दिसणारे शिल्प आहे. ते कदाचित शिकारीचे दृश्य असू शकते. या शिल्पामधून एक कथानक उलगडत जाते. यानंतर एक वर्तुळाकार नक्षीपट असून (D) त्याखाली पूर्ण विकसित कमळ व विद्याधर आहे. त्यानंतर तीन लहान वर्तुळात शंखाची शेवटची नक्षी पूर्ण होते. डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या मते शंखावरील शिल्पपट; विशेषतः मगर, विद्याधर, भौमितिक नक्षी यावरून या शंखाचा काळ ५व्या शतकाच्या अंतिम टप्प्यातील इ.स. ४७५चा असावा. अजिंठा लेणी क्र. एकमधील चित्र-शिल्पशैलीशी याचे साम्य आहे.
https://maharashtratimes.com/editorial/samwad/hostorical-kalyan/articleshow/48837808.cms
कल्याण, तालुका. - मुंबई. ठाणें जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुका. उत्तर अक्षांस १९० ४' ते १९० २२' व पूर्वरेखांश ७३० १' ते ७३० २४'. क्षेत्रफळ २७६ चौरस मैल. यांत कल्याण हा गांव व २२३ खेडीं आहेत. या तालुक्याची लोकसंख्या (१९११) ८२५४३. एकंदर उत्पन्न (इ.स. १९०३-४) २.२ लाख रुपये. तालुका त्रिकोणाकृती असून पश्चिमेकडील प्रदेश सुपीक आहे. येथील जमीन काळसर व खडकाळ आहे. बहुतेक प्रदेश सपाटीचा आहे. भात, नागली, वरी, वाल, मूग, हरभरा यांचें पीक बरेंच होतें. हवा साधारण निरोगी आहे. पाऊस सरासरी ९१ इंच पडतो. यांत सुमारें ११० तळीं, १२०० विहिरी, १९० नद्या व ओढे आहेत. उल्हास नदीच्या खाडींतून व जी. आय. पी. रेल्वेवरून येथें बराच व्यापार चालतो. व्यापाराचा बाहेर जाणारा माल म्हणजे भात, तांदूळ, गवत, लांकूड व कोळसा होय.
या प्रांताची सरपाटिलकी (स्वराज्यांत) कुलाबेकर आंग्ऱ्यांची होती. (रा. खं. ६-३४६). या प्रांतांत शके १५९७ मध्यें चाद्रसेनीय प्रभूंचें ग्रामण्य झालें होतें, त्याचें निवारण रघुनाथपंत अमात्य यांनीं केलें (कित्ता. ५२३). शिवाजीमहाराजांची स. १५७१ च्या सुमारास जीं राज्यांतील अकरा खजिन्याचीं मुख्य ठिकाणें होतीं त्यांपैकीं हें एक होतें (खं. ८.१७). शाहुछत्रपतीच्या वेळीं कल्याण प्रांतांत वीस तर्फा होत्या (कित्ता. १०६). इंग्रज वर घाटीं येत असतां कल्याण ते परशिक या भागांत विसाजीपंत बिनीवाले हे फौजेसह त्यांचे पाठीवर होते (स. १७७४). चासकर जोशांपैकीं रामचंद्र महादेव व कृष्णराव महादेव हे कल्याणचे सुभेदार होते (रा. खं. ११.१४).
गांव - मुंबई इलाखा ठाणें जिल्हा. कल्याण तालुक्याचें मुख्य ठिकाण. उत्तर अक्षांश १९० १४' व पूर्व रेखांश ७३० १०'. मुंबईच्या ईशान्येस ३३ मैलांवर जी. आय. पी. रेल्वेचें स्टेशन आहे. लोकसंख्या (१९११) १२६०० इ.स. १८५५ सालापासून येथें म्युनिसिपालिटी आहे. इ.स. १९०३-४ सालीं तिचें उत्पन्न १९५७९ रुपये होतें. येथें भात भरडण्याचा धंदा बराच आहे. त्याचप्रमाणें इतर व्यापारहि मोठा आहे.
येथें एक जुना दुर्गाडी नांवाचा किल्ला आहे. शेनाळी तलाव इ.स. १५०५ सालीं बांधला असें म्हणतात. शहाजहान बादशहाचा प्रधान मोतबरखान याची मशीद व काळी मशीद प्रेक्षणीय आहे.
इतिहास - पहिल्या, दुसर्या, पांचव्या व सहाव्या शतकांतील शिलालेखांत कल्याणचा उल्लेख सांपडतो. पेरीप्लुसच्या म्हणण्याप्रमाणें कल्याण दुसर्या शतकाच्या अखेरीस महत्वास चढलें. सहाव्या शतकांत पश्चिम हिंदुस्थानांतील प्रसिद्ध पांच व्यापारी पेठांपैकीं कल्याण एक असून येथें एक बलिष्ठ राजा राज्य करीत होता; व पितळ, शिसवाचें लाकूड व कापड यांचा मोठा व्यापार चालत होता असें कॉस्मस इंडिकोप्लुस्ट्स म्हणतो. चवदाव्या शतकांत कल्याण हें एका जिल्ह्याचें मुख्य ठिकाण होतें. मुसुलमानांच्या ताब्यांत हा गांव आल्यावर त्यांनीं या गांवाचें नांव इस्लामाबाद असें ठेवलें. इ.स. १५३६ सालीं हें गांव पोर्तुगीजांनीं जिंकलें. त्यांनीं येथें लष्कर ठेवलें नाहीं. परंतु इ.स. १५७० सालीं त्यांनीं या गांवावर पुन्हां एकदां स्वारी केली. त्यावेळी जाळपोळ करून बरीच लूट त्यांनीं या गांवातून नेली. या वेळेपासून हें गांव अहमदनगरच्या पातशाहींत होतें असें दिसतें. इ.स. १६४८ सालीं शिवाजीचा सेनापति आबाजी सोनदेव यानें कल्याणवर आकस्मिक छापा घालून तेथील सुभेदारास कैद केलें. इ.स. १६६० सालीं मुसुलमानांनीं तें जिंकलें. परंतु लवकरच म्हणजे इ.स. १६६२ सालीं त्यांस हा गांव सोडावा लागला. इ.स. १६७४ सालीं इंग्लिशांस येथें फॅक्टरी काढण्याची शिवाजीनें परवानगी दिली.
मुंबई अगर कोंकण यांतून वर घाटीं माल जावयाचा असल्यास जकात (मराठी राज्यांत) द्यावी लागे (खं. १२. १३३). सरकारी निरुपयोगी मालाचें लिलाव करण्याचें हें एक मोठें ठिकाण होतें (कित्ता १३७). सन १७८० च्या इंग्रज मराठ्यांच्या लढाईंत मराठ्यांचे सेनापति बाजीपंत होते. कल्याणच्या बागेंत इंग्रज (गाडरचीं २ पलटणें व मुंबईकरांचीं इतर पलटणें) होता. ता. ८ जून रोजीं रात्रीं जोराचीं लढाई होऊन मराठ्यांनीं ''बेतर्हा इंग्रजी लोकांस मार दिला... त्यांचे लोकांनां धीर धरवेना फौजा पाठीमागें गेल्या. कोंकणच्या दोन लढाईंत इंग्रज फारच नसीयत पावले.'' याच मोहिमेंत मराठ्यांकडील अंताजी नारायण ढवळे हे सरदार पडले, त्यामुळें पेशव्यांनीं त्यांच्या मुलास कल्याण प्रांतांत इनाम दिलें (खं. १०. १००, २१८; खं. १९. ९२). १८८७ त जें एकदा कल्याण इंग्रजांच्या ताब्यांत गेलें तें कयमचेंच (मुं. गॅ. इं. गॅ., राजवाडे खंड).
(२) पंजाब इलाखा. झिंद संस्थानच्या दाद्री तहशिलींतील एक गांव. उ. अ. २८० ३३' व पू. रे. ७६० १६'. दाद्री गांवाच्या पूर्वेस पांच मैलांवर दोन तीन हजार लोकवस्तीचा गांव आहे. चल जातीच्या कल्याण नामक राजाची ही राजधानी होती. त्यानें इ.स. १३२५ सालीं घियासुद्दीन तघलखाचा पुत्र अलफखान याच्याविरुद्ध बंड केलें. त्यांत सय्यद हिदायतुल्ला खानानें त्याचा पराभव करून त्यास ठार मारलें; परंतु खानहि त्या लढाईंत मारला गेला. त्याचें थडगें अद्यापि अस्तित्वांत आहे.
प्रत्येक नावात त्या त्या संस्कृतीचा इतिहास संचित झालेला असतो. एखाद्या विशिष्ट कालखंडात प्रचलित असलेल्या नावांवर त्या त्या काळातील समाजाच्या श्रद्धाकेंद्रांचा आणि प्रेरणांचा प्रभाव स्पष्टपणे लक्षात येतो. .
कल्याण.
आज आपण जेव्हा कल्याण हे नाव ऐकतो तेव्हा दोन गोष्टींचा बोध घडतो. एक म्हणजे शिव इतिहास व शिव संस्कृतीशी घट्ट नाते. आणि दुसरे म्हणजे कल्याण या शब्दाचा प्रचलित अर्थ तो म्हणजे शुभ आणि समृद्ध. आज कल्याण हि संस्कृती आणि कल्याण हे स्थळ यांची अशी भावनिक गुंफण झाली आहे कि कल्याणकरांसाठी या दोन गोष्टी विलग करणे निव्वळ अशक्यप्राय आहे. प्राचीन काळापासून ते आतापर्यंतचा कल्याण या संस्कृतीचा विकास आणि कल्याण या नावाचा प्रवासही अतिशय रंजक आहे.
कल्याण या नावाचे मूळ शोधण्यासाठी आपल्याला महाभारत, पुराणांपर्यंत जावे लागेल. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामांची कथा आहे. परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली.
आणि स्वतः पश्चिम भारतात आले. पौराणिक कथेनुसार परशुरामांनी स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामांच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामांनी सह्याद्रीवरून शरसंधान केले व समुद्राच्या मागे हटण्यामुळे जी भूमी तयार झाली तिथे स्वतःचे राज्य निर्माण केले. या राज्याचे नाव 'अपरांत'. आणि या राज्याची राजधानी म्हणून शुर्पारका तयार केले. हा 'अपरांत' प्रदेश म्हणजे आजचा साधारण 'कोकण' (कोन-कण म्हणजे बाणापासून तयार झालेली भूमी). पुढे हाच प्रांत 'परशुराम क्षेत्र' म्हणूनही ओळखू जाऊ लागला. आणि 'शुर्पारका' पुढे जाऊन 'सोपारा' व आजच्या काळातील नालासोपारा बनले. या अपरांत प्रदेशाचा उल्लेख महाभारतात वनपर्व आणि शांतिपर्वात, तसेच मार्कडेय पुराणात देखील आहे. कान्हेरी आणि जुनागढ येथील शिलालेखांतून तसेच अन्य सध्य-उत्खनातून हाती आलेल्या पुराव्यावरून असे दिसते कि कल्याण हे 'अपरांत' प्रांताला उर्वरित देशाशी जोडण्याचा दुआ आणि प्रवेशद्वार होते. आणि म्हणूनच बहुदा जसे कोणत्याही पूजेची सुरवात शुभ स्वतिकाने होते तसेच नवीन राज्याच्या भरभराटीचा शुभसंकेत म्हणून कल्याण हे नाव वापरण्यास आले असावे.
पुढे कल्याणचा लिखित पुरावा सातवाहन काळापासूनच्या म्हणजे इ. स. पूर्व २५० पासूनच्या अनेक शिलालेखात आणि प्रवासवर्णनात मिळतो.
टॉलेमी, पेरिप्लस या ग्रीक प्रवाशी लेखनात कल्याणचा उल्लेख आहे.
कान्हेरी येथील लेण्यात १२ शिलालेखात कल्याणचा उल्लेख आढळतो.
जुन्नर येथील शिलालेखत कल्याणचा उल्लेख आढळतो.
सातवाहन कालखंडानंतर कल्याणावर शिलाहारांचे राज्य होते.
६ व्या शतकात ग्रीक/इजिप्त व्यापारी कॉसमॉस इंडिकॉप्लुटसने कल्याणच्या बाजारपेठेची भरभरून वर्णन केले आहे.
या कालखंडातील कल्याणच्या विषयी समान धागा म्हणजे कल्याण हे भारताचा जगाशी संबंध ठेवणारे महाद्वार होते.
पाश्चिमात्य आणि भारत देशांमधील संस्कृती आणि ज्ञान देवाण-घेवाण करण्याचे माध्यम होते.
भारत अंतर्गत आणि विदेशी व्यापाराचे केंद्र होते.
आणि म्हणूनच जेव्हा ७ व्या शतकात चिनी प्रवाशी ह्युएन त्संग कल्याणचे वर्णन महाराष्टाची राजधानी करतो ते संयुक्तिक ठरते.
याव्यतिरिक्त महत्वाचा मुद्दा हा कि या प्रवासवर्णनात वा शिलालेखात कल्याणचा अपभ्रंश 'कल्यान', 'कलियान' किंवा 'कालियान' असा आढळतो.
हा अपभ्रंश आकस्मित नसतो तर त्या काळच्या संस्कृतीच्या, राजकीय शक्तींच्या परस्पर क्रियेचा परिपाक असतो.
तसेच या जगप्रसिद्धीमुळे 'कल्याण' हा खजिना लुटण्याचे प्रयत्न झाले नसते तर नवल!
साधारण यानंतर कल्याणने मध्ययुगात प्रवेश केला व अनेक शतके युद्धे सहन करून अंधाऱ्या काळाचा सामना केला.
आतापर्यंत अनेक शतके कल्याणच्या नावाचे अपभ्रंश होत होते. परंतु मध्ययुगात कल्याणचे नाव पूर्णपणे बदलण्याचाही प्रयत्न झाला.
मध्ययुगापासून ते आधुनिक काळापर्यंतचा कल्याणचा प्रवास आपण पुढच्या लेखात बघू .
पण त्यापूर्वी १८२८ सालची ब्रिटिश राजपत्रामधील कल्याणसंदर्भातील एक नोंद पुरेशी बोलकी आहे.
"स्थळ कालियानी : मराठा-मुघलामध्ये दीर्घ काळ चाललेल्या लढाईच्या जखमा येथे सर्वत्र दिसत आहेत पण तरीही इथली लोक आपल्या मातीत पाय घट्ट रुतवून उभे आहेत. बाह्य स्वरूपावरून येथे इतिहासात एक भरभराटीला आलेले नगर असल्याचे जाणवते, व इथली लोक व्यापार करून लढा देऊन पुन्हा आपल्या इतिहासातील जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत."
एका लढवय्या कल्याणकरची ओळख आणि समृद्ध कल्याणची नांदीच होती ती म्हणा !!
आपल्या इतिहासात समाज एकसंध राहण्यासाठी कलाकृतीची मंदिरे बांधण्याचा प्रभाव यादव, शिलाहार काळापासून आहे.
आपल्या ऐतिहासिक कल्याण शहराच्या आसपास शिलाहारांचा इतिहास उलगडून सांगणारी अनेक दानपत्रे, मंदिरे आणि नाणी उपलबद्ध होत आहेत. भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.
इस ८०० ते १२६५ अशा साडे चार शतकांच्या प्रदीर्घ कालावधीत शिलाहार राजघराण्याने उत्तर कोकण प्रांतावर राज्य केले. या राजघराण्याचा इतिहास समजण्याकरिता या राजांनी दिलेली ताम्रपट आणि शिलालेख स्वरूपातील दानपत्रे अतिशय मूल्यवान आहेत. शिलाहार राजे शिवभक्त होते. त्यांनी अप्रतिम भूमिज शैलीतील( पूर्व हेमाडपंती शैली) अनेक शिव मंदिरे बांधली. राजा झंझ याने बारा शिव मंदिरे बांधल्याचा उल्लेख इतिहासात आहे. कल्याण परिसरातच खिडकाळी, लोनाड मधील रामेश्वर/लोणादित्य आणि बापगाव येथील सुम्पेश्वर हि मंदिरे शिलाहार राजांच्या काळातील. शिलाहार राजांचा कालखंड आणि इतिहास आपण पुढे पाहणारच आहोत.
बापगाव येथे माळरानात अनेक वर्षे एक प्राचीन शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडलेला होता. शिलाहार राजा दुसरा केशिदेव याने कोरविलेला हा शिलालेख आता नष्ट झालेल्या सुम्पेश्वर मंदिराबद्दल काही माहिती देतो. इतिहासात इस १८८२ मध्ये ही शीला सापडल्याची नोंद आहे. त्यावरील लेखाचे वाचन पं. भगवानलाल इंद्राजी यांनी केले होते. लेखाची भाषा संस्कृत आणि लिपी नागरी आहे. या लेखात २२ ओळी आहेत.
सिद्धम । ॐ नमो विनायकाय ॥ नमामि भुवनोत्पत्तिस्थितीसंहारकारीणं(णम्) ॥ श्रीमत्षुंपेश्व
रंभक्तजनसर्वार्त्तिहारीणं ॥१ ॥ श्रीविद्याधरवंशमंडनमणिर्ज्जीमूतकेतो: कु
लेविख्यातोस्त्यपरार्क्कराजतनय (य:) श्रीकेशिपृथ्वीपति: । यस्यापारपवित्र
पौरुषनिधेरालोक्य राज्यस्थितिं श्रीरामादिमहिभुजां भगवती धत्ते
धरा न स्मृतिं ॥२॥स(श)क संवत् ११६१ विकारीसंवत्सरांतर्गत माघ वदि १४
चतुर्द्द्श्यां भौमे शिवरात्रौ पर्व्वणीअद्येह समस्तराजावलीसमलंकृ
तमहाराजाधिराजकोकणचक्रवर्त्तिश्रीकेशिदेवकल्याणवि
जयराज्ये तथैतत्प्रसात्समस्तराज्यमंडलचिंताभारं समुद्वहति ।
महामात्ये श्रीझंपडप्रभु महासांधिविग्र(हि)क राजदेवे पंडित श्री
करणभांडागारे अनंतप्रभुप्रमुखे(षु) सत्सु एतस्मिन्काले प्रवर्तमाने
सतिब्रह्मपुरीग्रामदानसा(शा)सनं समधिलिक्ष(ख्य)ते यथा ॥ श्रीषोंपेश्व
रदेव पूजनसदाव्यासक्तसर्वा(न्तरः) ।सत्पात्रद्विज सोमनायक
व (ब)टोःसंतानयो(भो)ग्यस्थितिं (तिम्)। श्रीब्र्ह्मपुरीपुरारिभवनक्ष्माभृन्मनोहा
रिणीं। वीर: कारयति स्म विस्मयमयीं श्रीकेशिपृथ्वीपति: ॥३॥ बटुक
नामानि कथ्यंन्ते ।सोमनाययक: सुर्य्यनायक: । गोविंदनायक: । नाऊ
नायक:। इति चत्वारो बटुका: ॥ निर्व्वाहाय पुरारिपूजकबटुश्रेणी द्वि
जानां सदावो(बो)पग्रामगता स्वसीमसहिता मां(जे/ज)सपल्लीपुरा दत्ता श्रीशि
वरात्रि पर्व्वणी विभोषोंपेश्वरस्याग्रत: श्रीमत्केशिनरेश्वरेण विमला चं
द्रार्क्कतारावधि॥४॥ (राज्य)स्य मंत्रीणान्यैर्व्वा कर्तव्यं धर्म्मपालनं । धर्म
ध्वंशे ... नरकस्थितिं ॥५॥ तथा चोक्तं पूर्वाचार्य्यमुनि
भि: । सुवर्णमेकं गामेकां भुमेरप्येकमंगुलं । हरन्नरकमाप्नोति या
(वदाभूत) संप्लवं ॥६॥ मंगलं महाश्री । (शुभं भ) वतु ॥ ले(ख)कपाठयोः ॥
हा शिलालेख म्हणजे राजाज्ञा होती. या आज्ञेचा अथवा नियमांचा भंग करणाऱ्यांसाठी गर्दभ शापवाणीचा धाक घालण्यात आला आहे. याचा नेमका अर्थ स्थानिक ग्रामस्थांना माहीत नसल्यामुळे या शिळेला स्पर्श झाल्यास गावावर संकट येईल, अशी त्यांना भीती वाटत होती. गावकऱ्यांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. इतिहासकार, जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभाग, पोलिस, लोणाडचे सरपंच, पोलिस आणि स्थानिक नेते यांनी संयुंक्तपणे अनेक वर्षे काम करून जनजागृती घडवून आणली. आणि २०१४ रोजी महाशिवरात्रीला सुमेश्वर/सुम्पेश्वर मंदिराजवळ शिलालेखाची साग्रसंगीत पूजा करून लोकांना दिसेलअसा लोखंडी जाळीआड सुरक्षित स्थापना केली. असे गावागावांतील ग्रामस्थांनी मनावर घेतले तर स्थानिक इतिहासाला बळकटी येईल. आपल्या अवतीभोवती असलेल्या ऐतिहासिक वास्तू, मंदिर, मूर्तीशिल्पांचे जतन संवर्धन करण्याचा आदर्श चौधरपाडा ग्रामस्थांनी समोर ठेवला आहे.
त्यानिमित्ताने सर्वांना जागतिक वारसा दिनाच्या शुभेच्छा.
सतराव्या शतकामध्ये बांधलेले कल्याणच्या पारनाक्यावर स्थित असलेले पोखरण मंदिर हे महाराष्ट्राच्या अध्यात्म परंपरेचे, प्राचीन नागरी आणि स्थापत्यशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे. आज येथे श्रीराम , त्रिविक्रम , गणेश आणि शंकराची मंदिरे पहावयास मिळतात. या परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी १७६५ मध्ये काही किलोमीटर अंतरावरील काळा तलाव येथून खापरीच्या पाईपने पाणी आणून गावातील चार गंजांना जोडले. मंदिराला लागूनच ६०-७० फूट खोलीची , २०,००० चौरस फूटाची पुष्करणी वा पोखरण गंज निर्माण केले. पोखरण गंज हे पाण्याच्या प्रश्नावरील उपायाप्रमाणे अनेक सामाजिक कार्यक्रमासही वापरात असत.
श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ.
एक उत्कृष्ट शासक, कि ज्यांनी भूगोलाचे भान व कुशाग्र बुद्धीच्या बळावर भारताच्या इतिहासाची दिशा बदलवली, त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचे पान कल्याणमध्ये लिहिले गेले.
एक अजेय योद्धा, ज्यांचे नाव अलेक्झांडर दि ग्रेट, ज्युलिअस सीझर सारख्या महान सेनानींच्या पंक्तीत घेतले जाते, त्यांच्या गृहस्थाश्रमाच्या प्रवेशसोहळ्याचे सौभाग्य कल्याणभूमीला लाभले.
एक युद्धनीती आणि शस्त्रविद्या निपुण लढवय्या कि ज्यांच्या पराक्रमाच्या सीमा कोणतेही राज्य, कोणतेही सैन्य ठरवू शकले नाही,
असे हे महान शासक कल्याणमधील पारनाका येथे जोशीवाड्यात विवाहबंधनात अडकले.
साताऱ्याचे शाहू महाराज यांच्या दरबारातील पेशवा म्हणजे पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ यांचे ज्येष्ठ पुत्र बाजीराव.
लहान वयातच ते एक उत्तम लष्करी नेता व मुत्सद्दी म्हणून तयार झाले. विसाव्या वर्षांतच त्यांच्याकडे ‘पेशवे’पद सोपविण्यात आले. बाजीरावांनी अल्पावधीतच चोख कामगिरी बजावत स्वराज्याचा विस्तार आणि विकास केला. निष्ठावंत सैनिकांतून मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गोविंदपंत बुंदेला ह्यांसारख्या शूर धाडसी सरदारांची फौज निर्माण केली
बाजीरावांचा जन्म इ. स. १७०० सालचा. बाळाजी विश्वनाथ यांची कृष्णाजी नाईक जोशींबरोबर ओळख पालीमधील मुक्कामादरम्यान झाली. कृष्णाजी व त्यांचा मुलगा महादजीं हे पिढीजात सावकार तसेच छत्रपतींच्या दरबारात पोतदार पदावर काम करत होते. महादजी पंतांकडे खानदेश, जुन्नर कल्याणपर्यंतचा सर्व भाग होता. राधाबाई म्हणजे बाळाजी विश्वनाथांच्या पत्नी यांनी महादजी नाईक यांची मुलगी काशीबाई बाजीरावांसाठी सुयोग्य स्थळ आहे हे ओळखले.
व याचेच पुढे रूपांतर १७१३-१४ मध्ये कल्याणच्या जोशीवाडा येथे विवाहात झाले. त्याकाळी ४ दिवस लग्नकार्य चाले.

असा हा ऐतिहासिक जोशीवाडा आता-आतापर्यंत म्हणजे १९९५-९६ पर्यंत होता.
आज या बुद्धिमान नेत्याच्या विवाहसोहळ्याच्या स्थळी 'अभिनव विद्यामंदिर' उभे आहे. आणि या कर्तृत्वाचा वारसा घेऊन अनेक बुद्धिमान मुले विद्यानिपुण होऊन भारताचा पताका जगभर मानाने फडकावत आहेत.
बाजीराव पेशवे यांच्या विवाहात त्यांना मधुपर्काच्या समारंभामध्ये जोशी कुटुंबीयांकडून संगमरवरी एकसंध अष्टकोनी चौरंग भेट देण्यात आला. कालांतराने जोशी कुटुंबीयांनी हा चौरंग पारनाका परिसरातील श्री त्रिविक्रम देवस्थानाला दिला. त्रिविक्रम मंदिरात काचेच्या बंद कपाटात हा चौरंग ठेवण्यात आला आहे.
त्रिविक्रम मंदिर, काशीबाई आणि कल्याणचा इतिहास पुढील लेखात.
आपल्या सूचना किंवा अभिप्राय कंमेंट किंवा मेसेज मार्फत कळवावा.
बाजीराव पेशवे यांच्या विवाहात त्यांना मधुपर्काच्या समारंभामध्ये जोशी कुटुंबीयांकडून संगमरवरी एकसंध अष्टकोनी चौरंग भेट देण्यात आला. कालांतराने जोशी कुटुंबीयांनी हा चौरंग पारनाका परिसरातील श्री त्रिविक्रम देवस्थानाला दिला. त्रिविक्रम मंदिरात काचेच्या बंद कपाटात हा चौरंग ठेवण्यात आला आहे.
कल्याणमधील अक्षत गणपती मंदिर हे जुना कापड बाजार येथे आहे. हा सर्व रस्ता परिसर बाजारपेठ म्हणूनच ओळखला जातो. हे मंदिर गलबतावर काम करणारे सरदार लेले यांनी बांधले. हे मंदिर पेशवेकालीन असून जवळजवळ ३०० वर्षे जुने आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचा विवाह कल्याणमध्ये झाला. पार नाक्यावर छत्रपती शिक्षण मंडळाचे अभिनव विद्यामंदिर आहे, त्या पूर्वी तिथे जो वाडा होता त्या वाडय़ात हा लग्नसोहळा झाला. प्रथेप्रमाणे लग्नकार्याची पहिली अक्षता गणपतीस द्यायची होती. पण या परिसरात जवळपास कोठेही गणपतीचे मंदिर नव्हते. लग्नाची अक्षत कोठे ठेवावी हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी या गणपतीची स्थापना झाली व बाजीराव पेशवे यांच्या लग्नाची अक्षत गणपतीपुढे ठेवण्यात आली. तेव्हापासून या गणपतीला अक्षत गणपती असे नाव पडले. तेव्हापासून या गणपतीला मंगल कार्याची अक्षत ठेवली जाते.
संपूर्ण महाराष्ट्रात भगवान श्री त्रिविक्रमाची मंदिरे अगदी मोजकीच आहेत. कल्याण पारनाक्यावरचे त्रिविक्रम मंदिर हे सुद्धा अशाच दुर्मिळ स्थानांपैकी एक.
पेशव्यांचे कारभारी श्रीमंत बळवंतराव मेहेंदळे १८ व्या शतकाच्या मध्यात गुजरात मोहिमेवरून परतत होते. त्यांनी येताना ही रेखीवमूर्ती सोबत आणली. ही मूर्ती १४-१५ व्या शतकातील असावी. ही गंडकी पाषाणाची मूर्ती असून तिच्याभोवती प्रभावळ आहे. या प्रभावळीवर दोन्ही बाजूंना दशावतार कोरले असून जय-विजय, राई-रखुमाई आहेत. ही मूर्ती चतुर्भुज असून पद्म, चक्र, शंख धारण केलेली आहे. येताना रात्र झाली म्हणून कल्याणमध्ये थांबले असताना आताच्या जागेसमोर फडणवीसांच्या आवारात मूर्ती ठेवली होती. या मूर्तीबाबतआख्यायिका सांगतात की तिने दृष्टांत देऊन असे सांगितले की मी जेथे थांबेल तेथेच माझे मंदिर उभारावे. त्याप्रमाणे मूर्ती दुसऱ्या दिवशी उठेचना. तेव्हा सर्वांनी मग तिला समोरच्या (आताच्या) जागेवर स्थापना करून मंदिर बांधले.
बाजीराव पेशवे यांच्या विवाहात त्यांना मधुपर्काच्या समारंभामध्ये जोशी कुटुंबीयांकडून संगमरवरी एकसंध अष्टकोनी चौरंग भेट देण्यात आला होता. हा चौरंग त्रिविक्रम मंदिरात काचेच्या कपाटात ठेवण्यात आला आहे,
कल्याणच्या इतिहासाने अनेक राजवटी पाहिल्या. अनेक राजकीय चढ उतार पहिले. पण प्रत्येक वेळी अंधाऱ कालखंडातून बाहेर पडून नावलौकिक वाढविले व 'कल्याण' हे नाम सार्थक केले. कल्याणच्या या इतिहासाचा साक्षीदार आणि सहप्रवासी म्हणून शेनाले वा काळा तलाव याचे नाव घेऊ शकतो.
कल्याणचा शेनाले / काळा तलाव हा जुन्या काळापासून कल्याण परिसरातील प्राशनयोग्य पाणीदाता होता. आणि म्हणूनच शेनाले तलावाला प्रवित्र मानले जात असे. ब्रिटिश गॅझेटरच्या नोंदीप्रमाणे कल्याणमध्ये ८ तलाव होते, त्यापैकी ३ तलावांना १२ महिने पाणी असे. या तीन तलावांपैकी फक्त शेनाले तलाव हा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत म्हणून वापरण्यात येत असे. 'शेनाले' हे नाव 'शेन' या पक्ष्यांवरून पडले. हे पक्षी तलावात बागडताना त्यांचे सोनेरी पंख चमकत असत. साधारण २४ एकरवर पसरलेल्या काळा तलावाभोवती इ. स. १५०६ साली आदीलशहाने चारही अंगांनी दगडी बांधकाम केले. जे आज अस्तिस्त्वात नाही. पुढे १७६०-७० च्या सुमारास कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी शेनाले तलावाचा जीर्णोद्धार केला. व खापरी नळ्याद्वारे गावातील चार गंजाशी जोडणी करून पाणीपुरवठा प्रणाली स्थापन केली.
काळाप्रमाणे शेनाले/काळा तलावाचे सांस्कृतिक महत्व अधिकच वाढले असून गणेशोत्सवापासून अनेक सणांमध्ये, विधींमध्ये काळा तलाव हा कल्याणकरांचा अविभाज्य घटक बनला आहे. पण काही अंशी दुर्लक्षामुळे पाण्यातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे तसेच पेशवेकालीन पाणी पुरवठा यंत्रणा निकामी झाली आहे. परंतु अलीकडेच पार पाडलेल्या सुशोभिकरण कार्यक्रमातंर्गत काळा तलाव हा लखाखून उभारला असून अजून अनेक शतके कल्याणची शान वाढवत राहील आणि कल्याणच्या इतिहासाची साक्ष मिरवत राहील.
कल्याणच्या इतिहासाचा विचार करता बहमनींची सत्ता येथे होती, तसेच पोर्तुगीजांनी सन १५७० मध्ये कल्याण शहर जाळून टाकल्याविषयीचा उल्लेख मिळतो व यामुळे विजापूर व अहमदनगरच्या सुलतानांनी आणि कालिकतच्या झामोरीनने गोव्यावर संयुक्त आक्रमण केले याविषयीची नोंद उपलब्ध होते.
तेव्हा सातवाहन काळात वैभवाच्या शिखरावर असलेले शहर पुढे ५-६व्या शतकात या पूर्णाकार विष्णूमूर्ती व मंदिराच्यामुळेसुद्धा लक्षणीय असावे. उत्तर काळात झालेल्या विध्वंसाचा परिणाम म्हणून मूर्तीला लेंडी जलाशयाचा आश्रय घ्यावा लागला व येथील वर उल्लेखित मूर्ती व मूळ मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण शंखसुद्धा हलवला गेला असावा. कालौघात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व परकीय आक्रमणाच्या संकटातूनही कल्याणकरांनी आपला इतिहास मात्र जतन केला असेच म्हणावे लागेल! महाराष्ट्रातील पूजेत असलेली ही एकमेव प्राचीन विष्णूमूर्ती आहे.
कल्याणच्या सुभेदाराची सून - Shodh Itihasacha
शिवचरित्र वाचत असताना किंवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य अभ्यास करताना. बऱ्याचदा आपल्याला कल्याण च्या सुभेदाराच्या सुनेच्या पात्रा विषयी वाचायला मिळतं अनेकदा अनेक भाषणांत ऐकाला देखील मिळतं. त्या पत्राविषयी शिवकालीन इतिहास अभ्यासकांमध्ये दोन गट पडलेले आपल्याला दिसतात.
एक जे हे पात्र(कल्याणचा सुभेदाराची सून) नाकारतात आणि दुसरे जे या पात्राचं पात्राचं म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धोरण स्वीकारलं त्या बद्दल जे धोरण स्वीकारलं त्या धोरणाचं समर्थन करतात.
सर्वात अगोदर हे प्रकरण नक्की काय आहे इतिहासात नेमकं कुठं सापडलं आणि कधी घडलं याचा अभ्यास करूयात. कल्याणच्या सुभेदारच्या सुनेच्या कथेची माहिती आपल्याला समकालीन नसली तरी ऐतिहासिक बखरींत सापडते. पहिली बखर आहे शककर्ते शिव छत्रपती महाराज आणि दुसरी बखर आहे शिवदिग्विजय.
आबाजी सोनदेव यांजकडे कल्याण प्रांताचा सुभा होता. त्या प्रांतामधील गडकोट यांच्या तटा बुरुजांच्या निगराणी ची जबाबदारी महाराजांनी त्यांजवर सोपविली. ज्या वेळी कल्याण प्रांत महाराजांनी घेतला त्यावेळी ‘मुलाणा हयाती’ नावाचा विजापूरकरांचा सुभेदार त्या प्रांतावर होता.
स्वराज्य वृद्धीसाठी कल्याणच्या सुभ्यावर मराठ्यांनी हल्ला करून अमाप संपत्ती हस्तगत केली. त्याकाळचे आक्रमक यवन स्वराज्याच्या लेकी बाळी बाटवण्यासाठी उचलून नेत असे. म्हणून की काय कोण जाणे कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून आबाजी पंतांनी उचलून आणली. व सुंदर “भेट” शिवरायांना उपहार म्हणुन पाठविली. या “उपहारावर” कडवी प्रतिक्रिया व्यक्त करीत शिवरायांनी आबाजीपंतांना खडे बोल सुनावले.
यापुढे असे कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असे वर्तन होता कामा नये असा सज्जड दम भरला. इतकेच नव्हे तर त्या सुभेदाराच्या सुनेची खणानारळाची ओटी भरून पालखीत बसवून मुघल छावणी मधे तिची सुखरूप रवानगी केली. या सुनेच्या विषयी शिवराय म्हणाले की जर आम्ही या सुंदर माऊलीच्या पोटी जन्मलो असतो तर आम्ही ही असेच सुंदर असतो.
ही ढोबळ कथा कमी अधिक फरकाने दोन्ही बखरीमध्ये उपलब्ध आहे. बखर ऐतिहासिक असल्यातरी त्या समकालीन नक्की नव्हत्या. कारण पहिली बखर आहे ‘शककर्ते श्री शिव छत्रपती महाराज’ जी लिहिली मल्हार रामराव चिटणीस यांनी, १८१० साली सातारा छत्रपती दुसरे शाहू उर्फ प्रतापराव ह्यांच्या आज्ञेवरून त्यावेळच्या गादीचे चिटणीस मल्हार रामराव यांनी हि बखर लिहिली.
बाळाजी आवजी चित्रे यांच्या नातवाने ही बखर ऐकीव माहिती नुसार आणि वडिलोपार्जित जी कागदपत्रे त्यांच्या संग्रही होती त्या नुसार ही बखर लिहिली.
दुसरा उल्लेख आढळतो ती बखर आहे शिवदिग्विजय. ही बखर कोणी लिहिली याचा उल्लेख कुठे आढळत नाही, परंतु बडोद्याच्या पांडुरंग रामचंद्र नंदुरबारकर व लक्ष्मण काशिनाथ दांडेकर यांनी १८९५ साली हा दस्त प्रकाशित केला. हि बखर प्रकाशित झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्वाण झाल्यावर लगेचच लिहिली असं प्रकाशकांच मत होतं.
समकालीन एकही पुरावा नसल्याने ही एक दंतकथा आहे असं म्हणायला वाव आहे. परंतु शिवकालीन इतिहासाचा अभ्यासपूर्ण लेखन करणारे वा सि बेंद्रे यांनी अश्याच आशयाची कथा सांगितली आहे.
वाई जवळच्या गोळेवाडी च्या सुभेदाराची सून भेट म्हणून महाराजांच्या समोर पेश केली त्यावर महाराजांनी ब्राम्हण सरदाराला (पुस्तकात तसा उल्लेख आहे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर शुद्ध अंतःकरणाने माफी मागतो) शिवाजी महाराजांनी तिखट प्रतिक्रिया देऊन काशीस जाण्यास सुनावले. ही १९७२ साली कथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिकित्सक चरित्र खंड एक पान क्रमांक ११४ वर उपलब्ध आहे.
जर ही घटना आहे अशी समजली तर कल्याणच्या छाप्या दरम्यान कल्याणच्या सुभेदाराची सून कदाचित घाबरून पेटाऱ्यात लपली असू शकते. तो पेटारा तसाच मराठयांनी आणला आणि हा प्रसंग घडला असू शकतो असा तर्क आपण लावू शकतो. पण आबाजी सोनदेव हे प्रतिष्ठित आणि विश्वासू सेवक असल्याने ते असं जाणीवपूर्वक करतील असं वाटतच नाही.
इतिहासात जर तर आणि तर्काना काही अर्थ निश्चितच नसतो. परंतु हा प्रश्न असा पडतो कि ज्या गौरवशाली इतिहासाचे दाखले देऊन आपण नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी आमच्या काय किंवा शत्रूंच्या लेकीबाळीवर न्याय केला आहे का नाही?
‘परस्त्री ही मातेसमान’ मानणाऱ्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उदात्त विचार किती गंगे समान निर्मळ आहे याचा एक ऐतिहासिक पुरावा म्हणून ‘कल्याणच्या सुभेदाराची सून’ ह्या प्रकरणाकडे आपण नक्की बघू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘परस्त्री विषयी असलेले आदरयुक्त धोरण’ एवढाच शुद्ध हेतू ला लेख लिहिण्या मागे आहे.
किल्ले दुर्गाडी
- प्रमोद मांडे
कल्याण शहर उल्हास नदी, खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंद खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणार्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच प्रतिष्ठाण (पैठण) या राजधानीकडे रवाना होत असे.
हा भाग निजामशाही (अहमदनगर) च्या अस्तानंतर आदिलशाही (विजापूर)च्या ताब्यात आला. इ.स. १६३६ नंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५४मध्ये घेतला. त्यावेळी कल्याण बरोबर भिवंडीही ताब्यात आणली.
कल्याण सारखे महत्त्वाचे बंद ताब्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवाने येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खंदत असताना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाही ही दुर्गेचीच कृपादृष्टी समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले.
दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. येथे निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिर्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला.
कल्याणच्या बसस्थानकापासून रिक्षाने १५ मिनिटात दुर्गाडी किल्ल्याजवळ पोहोचता येते. किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. या मार्गावर पूर्वी दरवाजा होता, याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाता असे. येथे गणेशाची मूर्ती आहे.
दुर्गाडीच्या लहानशा किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांचा नेहमीच राबता असतो. मंदिरात पूर्वीचा देवीचा तांदळा असून नव्याने बसविलेली मूर्तीही आहे.
मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे. गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. दुर्गाडीचा किल्ला लहान असल्यामुळे सर्व परिसर पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास पुरेसा आहे.
दुर्गाडी किल्ला
इसवी सन पूर्वीच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून जगाच्या नकाशावर कल्याण हे बंदर आणि भरभराटीला आलेले व्यापार केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. उल्हास नदीच्या तीरावरील जहाज नांगरणीस सुयोग्य नैसर्गिक धक्का, माळशेज घाट, भोर घाट या घाट रस्त्यामार्फत उत्तर आणि दक्षिण भारताशी सोयीची जोडणी, मध्यपूर्व आणि पाश्चिमात्य देशांशी जलमार्ग वाहतुकीस सुनियोजित बंदर अशा अनेक भौगोलिक कारणांमुळे कल्याण एक प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून उदयास आलेले होते. यामुळेच ह्यएन त्संग हा चिनी प्रवाशाने कल्याणाचा उल्लेख महाराष्ट्राची राजधानी म्हणून केला आहे.
सन १६५७ मध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी उत्तर कोकण मोहीम काढली. म्हणजे त्याकाळी आदिलशहाचा अंमळ असलेल्या कल्याण भिवंडी हे प्रदेश स्वराज्यास जोडण्याचे ठरवले. आदिलशहाने आपली उत्तर कोंकणातील संपत्ती गुप्तपणे पुरंदर आणि तेथून विजापूरला नेण्याचे ठरवले होते. परंतु खजिना हलविण्याचा आधीच मोहिमेच्या अंतर्गत दादाजी बापुजी रांझेकर यांनी २४ ऑक्टोबर १६५७ या दिवशी कल्याण ताब्यात घेतले. संपूर्ण खजिना, बंदरातील उभी असलेली देशी विदेशी जहाजे महाराजांच्या ताब्यात आली. कल्याण ताब्यात घेतल्या नंतर महाराज स्वतः कल्याणमध्ये दाखल झाले. कल्याण खाडी किनारी असलेला दुर्गाडी किल्ला तेव्हा एक टेहळणी चौकी होती. दुर्गाडी किल्ल्याचे स्थान आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याची डागडुजी करून किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर उभारून व आई जगदंबेचे नाव किल्ल्याला देऊन उत्तर कोंकणातील प्रवेश द्वारच बनविले. किल्ल्याचे खाडीकिनारी स्थान, बंदराचे आणि व्यापारमार्गाचे महत्व, नौकाबांधणीचा उद्योग या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराजांनी कल्याण बंदरातून हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार उभारण्याचे ठरविले. अर्वाचीन इतिहासामध्ये समुद्राचे आणि आरमाराचे महत्व जाणणारे शिवाजी हे पहिले राजे होते. राजांच्या या दूरदृष्टी धोरणामुळे कल्याणच्या व स्वराजाच्या सोनेरी इतिहासामधील हा वारसा आपल्याला प्राप्त झाला
http://www.behistorical.com/durgadi-fort-information-kalyan-mumbai/
“ज्याचे गडकोट त्याचे स्वराज्य आणि ज्याचे आरमार त्याचा समुद्र. . .” हे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच पक्के ओळखले होते. इंग्रज, सिद्दी, डच, पोर्तुगीज ह्या परकीय शत्रूंपासून स्वराज्याला निर्धोक ठेवायचे असेल तर हिंदवी स्वराज्यासाठी स्वतंत्र आरमाराची बांधणी करणे हि काळाची गरज होती.
कल्याण शहर म्हणजे शिवपूर्व काळापासून एक प्रमुख बंदर म्हणून प्रसिद्ध होते. शहराच्या संरक्षणार्थ चहुबाजूने तटबंदी, एकूण ११ बुरुज आणि अनेक लहान-मोठे दरवाजे बांधले होते. सन १६५४ साली शिवाजी महाराजांनी भिवंडी, कल्याण हि प्रमुख ठाणी जिंकून घेतली. कल्याण मधून वाहणारी उल्हास नदी थोडे अंतर पुढे जाऊन समुद्राला मिळते. ह्या उल्हास नदीच्या खाडीवर एका छोट्याशा टेकडीवर शिवाजी महाराजांनी किल्ल्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली. हि सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून किल्ल्यास दुर्गाडी नाव दिले गेले. किल्ल्यामध्ये आरमाराची गोदी बांधून लढाऊ जहाजबांधणीचा कारखाना सुरु झाला. दुर्गाडी किल्ल्यामध्ये एकूण ३४० पोर्तुगीज कारागीर जहाज बांधणीच्या कामी असल्याची नोंद इतिहासात सापडते.
दुर्गाडी किल्ल्यास भेट देण्यासाठी मुंबई शहरापासून केवळ ४० किमी अंतरावर असलेले कल्याण शहर गाठावे. शहराच्या मध्यभागीच दुर्गाडी किल्ला वसलेला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी दुर्गादेवीचे सुंदर मंदिर आहे. नव्याने उभारलेल्या कमानीतून प्रवेश करताच समोर एक छोटीशी गणपतीची मूर्ती दिसते. म्हणून ह्या प्रवेशद्वाराला गणेश दरवाजा असेही म्हणतात. थोडी तटबंदी आणि बुरुजांचे बांधकाम पार करून देवीच्या मंदिराकडे जाता येते. उल्हास नदीकडील भागाकडे देखील किल्ल्याची थोडीशी तटबंदी आणि दोन बुरुजांचे बांधकाम दिसते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युंनतर १६८२ साली दुर्गाडी किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. हसन अली खान ह्या मोघल सरदाराने कल्याण प्रांत मोघलांना जिंकून दिला मात्र संभाजी महाराजांनी अल्पावधीतच हल्ला करून कल्याण प्रांत परत स्वराज्यात समाविष्ट केला. संभाजी महाराजांच्या मृत्युंनतर १६८९ मध्ये कल्याण प्रांत परत मोघलांच्या ताब्यात गेला आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीस पेशवाईमध्ये शामिल झाला. पेशवाईच्या काळात कल्याणचे सुभेदार रामजी बिवलकर यांनी किल्ल्यातील दुर्गादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. १७२८ साली पोर्तुगीजांनी दुर्गाडी घेण्यासाठी किल्ल्यावर हल्ला केला मात्र किल्लेदार शंकरजी केशव आणि त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला परतवून लावला.
आजमितीस किल्ल्याची आधुनिक पद्धतीने डागडुजी झाली आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या दुगादेवीच्या दर्शनासाठी बरेच भाविक येत असतात. त्यामुळे आधुनिक पद्धतीने बांधलेले देवीचे मंदिर, रंगकाम केलेले किल्ल्याचे बुरुज-तटबंदी, किल्ल्याच्या अंतर्गत भागात बांधलेला सिमेंट-फरशी चा पादचारी मार्ग, बसण्यासाठी असलेले लोखण्डी बाक तसेच किल्ल्याच्या बाहेरील बाजूस असलेली हार-फुलांची दुकाने ह्या सर्वांमुळे किल्ल्याला एका देवस्थानाचे स्वरूप आल्यासारखे वाटते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी तर अवश्य यावेच मात्र त्या सोबत दुर्गाडी किल्ल्याचे इतिहास महत्व देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. दुर्गादेवीच्या मंदिरासोबतच आपण अशा एका ऐतिहासिक स्मारकास भेट देतआहोत कि ज्याच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व परकीय सागरी शत्रूंना पुरून उरेल असे बलाढ्य आरमार उभारले होते याची आठवण देखील मनात असायला हवी.
दुर्गाडी.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या शहरातील दुर्गाडी किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनी मराठा साम्राज्यातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. बोरघाटात उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटातुन वाहत येणारी काळ नदी या उपनदया येऊन मिळतात. या खाडीला भरपुर पाणी असल्याने पुर्वीच्या काळी या खाडीतुन मोठी गलबते सहजरीत्या ये-जा करत असत. याच उल्हास खाडीकिनारी कल्याण बंदर व शहर वसलेले आहे. कल्याण स्थानकात उतरुन बसने अथवा खाजगी वाहनाने १५ मिनीटात दुर्गाडी किल्ल्यावर जाता येते.
खाडीकडून कल्याण शहरात शिरताना शहराच्या प्रवेशद्वारावरच शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला दुर्गाडी किल्ला खाडी किनारी लहानशा टेकडीवर उभा आहे. किल्ल्याकडे जाताना अलीकडील चौकात असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपले लक्ष वेधुन घेतो. किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले असुन त्याला लागुन असलेले बुरुज मात्र शिल्लक आहेत. या बुरुजात गणेशाची लहानशी संगमरवरी मुर्ती असुन हा दरवाजा गणेश दरवाजा म्हणुन ओळखला जातो. गणेश दरवाजाच्या डाव्या बाजुने जाणारी वाट टेहळणी बुरुजाकडे जाते तर उजव्या बाजूची वाट वर दुर्गादेवी मंदिरात जाते. टेहळणी बुरुजाकडून गडाच्या मागील भागात जाता येते पण तेथे जाण्यास मनाई आहे.
दुर्गादेवीचे मंदिर लहानसे असुन त्याचा जिर्णोध्दार पेशवे काळात कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी केला. मंदिरात देवीची ३ फुट उंचीची नवीन मुर्ती असुन देवीचा जुना तांदळा त्याच मूर्तीच्या बाजूला ठेवण्यात आला आहे. मंदिराचा गाभारा छोटासा असुन कळस गोल घुमटाकार आहे. मंदिराच्या मागील बाजुस इदगाह असुन तेथे जाण्यास मागील बाजुने पायऱ्या आहेत पण सध्या येथे जाण्यास मनाई आहे. याखेरीज खाडीच्या बाजुला दोन मोठे भग्न बुरुज व थोडे तटबंदीचे अवशेष आहेत. गडावरील इतर अवशेष काळाच्या ओघात लुप्त झालेले असुन गडसंवर्धनासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न पहायला मिळतो. गडाला रस्त्याच्या बाजुने फेरी मारली असता तटबंदीत असणारे जुने घडीव दगड व त्यावर नव्याने केलेले बांधकाम तसेच जुन्या खाडीपुलावरून किल्ल्याची खाडीकडील बाजु पाहता येते. दुर्गाडी किल्ला व परिसर पाहण्यासाठी अर्धा तास पुरेसा आहे.
सातवाहन काळात कल्याण बंदर म्हणुन प्रसिद्ध होते. मध्यपुर्व आशिया खंडात रोमपर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरात येणारे सामान तेथुन नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच पैठणकडे रवाना होत असे. अहमदनगरच्या निजामशाही अस्तानंतर हा भाग विजापूरच्या आदिलशाहच्या ताब्यात आला. आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा २४ ऑक्टोबर इ.स.१६५७ मध्ये दिवाळी वसुबारसच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. यावेळी कल्याण शहराला संरक्षणासाठी भक्कम तटबंदी, ११ बुरुज व अनेक दरवाजे होते. ज्याचा गड त्याची जमीन’ आणि ज्याचे प्रबळ आरमार त्याचा समुद्र हा मंत्र महाराजांनी जाणला होता. कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर ताब्यात आल्याबरोबर जमिनीप्रमाणे समुद्रमार्गेही शत्रु आपल्यावर चाल करुन येऊ शकतो या जाणिवेतुन शिवाजी महाराजांनी आबाजी महादेवांना कल्याणच्या भुईकोटा शेजारी खाडीकिनारी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खणत असताना अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाले ही दुर्गादेवीची कृपा समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले. या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती सुरु केली. या कामाकरीता दुप्पट मोबदला देऊन पोर्तुगीजांचे सहाय्य घेण्यात आले.
गलबते बांधण्यासाठी ३४० पोर्तुगिज कारागीर येथे काम करत होते. पोर्तुगीज दुर्गाडीस गोद्रेलस म्हणत. महाराजांच्या या आरमाराची दखल फ्रेंच आरमाराने घेतली व डोंगरातील राजा आता समुद्रात उतरतोय तेव्हा तुमचे बस्तान कुठे ठेवायचे ते तुम्हीच ठरवा अशा आशयाचे पत्र वसईतील पोर्तुगीजांना लिहिले. त्यामुळे येथील कारागीर एका रात्री काम अर्धवट टाकुन पळुन गेले व उर्वरीत काम स्थानिक कारागिरांनी पुर्ण केले. या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना , वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीलाही दहशत बसविली. इ.स. १६८२साली मोगल सरदार हसनअली खान याने कल्याण जिंकले पण संभाजीराजांनी हल्ला करुन कल्याण परत ताब्यात घेतले. नंतर १६८९ मध्ये मोगलांनी परत कल्याण जिंकले. इ.स १७२८ मध्ये पोर्तुगिजांनी दुर्गाडी किल्ल्यावर हल्ला केला पण पेशव्यांचे किल्लेदार शंकरजी केशव,गंगाजी नाईक व त्याच्या साथीदारांनी हा हल्ला यशस्वीपणे परतवुन लावला. मराठा आरमाराचा मुहुर्त करणारा अनेक लढायांचा व रोमहर्षक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला एकदा तरी पहायला हवा.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
२४ ऑक्टोबर १६५७ रोजी कल्याण जिंकल्यानंतर महाराजांनी कल्याण बंदरातून हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार उभारण्याचे ठरविले.
महाराजांकडे समुद्राचा अनुभव जवळपास नव्हता तरीही द्रष्टया राजांनी आरमाराच्या उभारणीचा निर्णय घेतला. या निर्णयामागची दूरदृष्टी समजण्यासाठी काळाची काही पाने उलगडणे आवश्यक ठरते.

ठाणे-उल्हास खाडी हा प्राचीन जलमार्ग म्हणजे समृद्ध व्यापारी मार्ग. याच मार्गावर अंतरा-अंतरावर खाडीकिनारी ठाणे, कल्याण, भिवंडी, चेंदणी, महागिरी, कोलशेत, नागला, गायमुख, घोडबंदर इत्यादी बंदरे व्यापारी बंदर म्हणून उदयास आली होती. अरब व्यापाऱ्यासमवेत या मार्गाद्वारे होणाऱ्या व्यापारामुळे हि बंदरे व तसेच तेथील राज्यकर्ते आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले होते.
इ.स. 1498 साली वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला आणि येथूनच पोर्तुगीजांच्या आरमारी वर्चस्वाची आणि अरबांच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या दर्यावर्दी पोर्तुगीजांनि खाडीकिनारी वखारी स्थापन केल्या. संपूर्ण अरब व्यापाऱ्यांना संपविण्याचे पोर्तुगीजांचे धोरण होते, त्या दृष्टीने वखारीच्या आडोशाने खाडीकिनारी जागोजागी लहानसहान चौकीवजा कोटकिल्ले बांधण्यात आले. ठाणे, हिराकोट, पारसिक, पिंपळास कोट, कांबे किल्ला, खारबावची गढी, नागला कोट, गायमुख गढी, मालजगढी, घोडबंदर किल्ला, धारावी किल्ला आणि वसई किल्ला असे किल्ले यातूनच उभे राहिले.
सन १५३३-३४ मध्ये हुमायून बादशहाने गुजरातवर चाल केली तेव्हा घाबरून गुजरातच्या शहाने पोर्तुगीजांची मदत घेतली आणि त्या बदल्यात मुंबईच्या सात बेटांसह ठाणे, वसई प्रांत-पोर्तुगीजांना बहाल केला. पुढे पोर्तुगीजांनी त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांवर जबर कर बसविला. त्यामुळेच प्राचीन काळापासून देशोदेशी चालत आलेला अरब व्यापाऱ्यांचा व्यापार-उदीम बंद पडला.
शिवाजी महाराजांचा जन्म पुढे १०० वर्षांनी म्हणजे १६३० साली झाला परंतु महारांजांनी पोर्तुगीज लोकांचा अंतस्थ धूर्त हेतू दूरदर्शीपणे लवकरच हेरला. सन 1656 साली महाराजांनी चंद्ररावाचा पराभव करून जावळी खोरे ताब्यात घेतले. आणि या खोऱ्यालगत कोकणात महाराजांचा प्रवेश झाला. साहजिकच परकीय आरमारी सत्तांशी संघर्षाची सुरुवात झाली.
या पार्श्वभूमीवरच जेव्हा सन १६५७ साली शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकले, लगेचच वसुबारसेच्या मुहूर्तावर महाराजांनी आरमारी जहाजांचा कारखाना सुरू केला. या गोदीतून तरांडी, तारवे, शिबाडे, गुराबा, पगारा, तीरकाठी, मचवा, पाल, संगमिऱ्या आणि फत्तेमाऱ्या अशा निरनिराळ्या आकाराची लढाऊ जहाजे तयार होऊ लागली. हि आरमारी जहाजे ठाणे खाडीतूनच दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत जात-येत होती. शिवकालात मराठयांचे आरमार लहान नौकांचे व वेगवान होते. हि आरमारी जहाजे अरुंद व नालेचा भाग लांबलचक निमुळता असल्यामुळे पाणी सहजपणे कापीत चपलतेने पुढे जात. आरमार उभारताना कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, दौलत खान असे हिरे उभरून चकाकत बाहेर आले.
महाराजांच्या अल्पावधीत केलेल्या प्रगतीची साक्ष ठाणे-वसईच्या गव्हर्नरांनी आरमार स्थापनेच्या दोनच वर्षांनी लिहिलेले पत्र देते. १६ ऑगस्ट १६५९ रोजी फ्रॅन्सिस्को-द-मेलो-ए-कस्ट्रो आणि अँटोनिया-डी-सोझा कुतिन्हो आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'आदिलशहाचा सरदार शहाजी याच्या मुलाने वसई, चौलजवळचा प्रदेश जिंकला असून कल्याण, भिवंडी, पनवेल येथे आरमार व सैन्य सजविले आहे. म्हणून आम्ही आमच्या कप्तानांना हुकूम देऊन ठेवला आहे की त्यांच्या गलबतांना अटकाव करा.'
महाराजांच्या वाटचालीचे दुसरी साक्ष म्हणजे सुरुवातीला स्वराज्य आरमार सामर्थ्याला खिजगणितही न धरणारे इंग्रज राज्यकर्ते यांचे पत्र . १ नोव्हेंबर १६७९ रोजी इंग्रज कप्तान मुंबईच्या गव्हर्नरला लिहितो, 'शत्रूची (शिवाजी महाराजांची) गॅलव्हेटस आमच्या समोरून सहज निघून जातात. आमच्या शक्ती त्यांच्यापुढे चालत नाही, कारण या लहानशा होड्या आम्हाला सहज व आश्चर्यकारकपणे चकवतात. आता आम्हाला असे वाटू लागले आहे की,आमच्याकडे तसल्या होड्या असतील तर आम्हालाही मदत होऊ शकेल'
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाडीकिनारी दुर्गाडी किल्ला बांधून स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेल्या स्वराज्याच्या आरमाराने शिवोत्तर कालात पश्चिम सागरात प्रबळ सत्ता निर्माण केली. एक काळ पोर्तुगीजांचा परवानगीशिवाय भारतीय उपखंडाच्या सागरात संचार करणे अवघड होते. परंतु कालांतराने समुद्रसंचारासाठी स्वराज्याच्या मराठा आरमाराची परवानगी काढणे आवश्यक ठरू लागले. 'ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र.' हे महाराजांचे स्वप्न सत्यात उतरले होते.
सुवर्ण इतिहासाच्या या पाऊलखुणा आजही आपल्या कल्याणमध्ये व आजूबाजूला आहेत. दुर्गाडी किल्ल्याशेजारी तसेच याच खाडीवर पुढे अजून अनेक गावात आजही नौकाबांधणी सुरु आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या पश्चिमेला आजच्या सात पूलच्या बाजूला पिंपळास गडाचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत
दुर्गामाता मंदिर
हजारो वर्षांच्या इतिहासाचा अखंड प्रवाह लाभलेले आपले कल्याण अनेक सुवर्णांकित घटना आणि वास्तूंचा वारसा जतन करून आहे.
दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामातेचे मंदिर हे या इतिहासातील सोनेरी पान. दुर्गामातेच्या मंदिराचा सर्व कल्याणकरांच्या हृदयात एक विशिष्ठ स्थान आहे.
दुर्गाडी किल्ल्याच्या इतिहासाची काही माहिती आपण मागील पोस्टमध्ये घेतली. (लिंक कंमेंट मध्ये). सुभेदाराची सुन घटना, छत्रपतींचा कल्याण चरणस्पर्श, अशीच आमुची आई असती सुंदर, रूपवती, आम्हीं ही सुंदर झालो असतो वदन, स्त्रीशक्तीच्या उपासनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले भवानी मातेचे मंदिर, दुर्गाडी किल्ल्यावरून भवानी मातेच्या आशीर्वादाने पहिल्या हिंदवी आरमाराची स्थापना या सर्व घटना कल्याणच्या इतिहासाची पूर्व आणि पश्चात विभागणी करतात. पुढे १७३९ मध्ये मराठ्यांनी वसईचा किल्ला सर केला. या युद्धात पराक्रम गाजविलेल्या शंकराजी फडकेंना वसईचा सुभेदार नेमण्यात आले. या इतिहासकाळात वसई, कल्याण आणि साष्टी यांची विशिष्ठ नोंद आहे. १७४४ मध्ये दुर्गादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवे मंदिर बांधल्याची नोंद पेशवे दफ्तरात सापडते. तसेच त्याठिकाणी वेदमूर्ती महादेवभट गोडबोले यांची श्री दुर्गाभवानी किल्ले दुर्गाडी, कोट कल्याण येथे पूजाअर्चा करण्यासाठी नेमणूक केली. तेव्हापासून आजपर्यंत तेथे नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा होत आलेला आहे.
फिरंगाणातील अर्थात मुंबई परिसरातील किल्ले : दुर्गाडीचा किल्ला
कल्याण हे खाडीीकिनारी असलेले गाव अगदी प्राचीन काळापासून व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध होते. सातवाहनांच्या काळापासून या बंदरातून व्यापार चालू होता. यादवांच्या पाडावानंतर हा मुलुख मुसलमानांच्या ताब्यात गेला. बहामनी राज्याच्या स्थापनेनंतर कल्याण शहर प्रथम बहामनी राज्यात होते. पहिल्या अहमदशहाने उत्तर कोकणावर स्वारी करुन इतर मुलुखाबरोबर कल्याणही जिंकले व पुढे आपल्या स्वतंत्र शाहीची (निजामशाहीची) घोषणा केली. याप्रमाणे कल्याण निजामशाहीत आले.पुढे विजापूरचा आदिलशहा व दिल्लीचे मोगल यांनी संयुक्त चढाई करुन निजामशाही संपवली व परिणामत: कल्याण आदिलशाही साम्राज्याचा भाग बनला.
इ.स.1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणावर मोहिम काढली. त्यावेळी महाराजांनी दादाजी बापूजी रांझेकरांना कल्याण काबीज करण्यास फर्मावले व त्यानुसार रांझेकरांनी दिनांक 24 ऑक्टोबर 1657 रोजी कल्याण काबीज केले. कल्याण काबीज होताच शिवाजी महाराज स्वत: कोकणाच्या स्वारीवर निघाले. फौजेसह ते नुकत्याच जिंकलेल्या कल्याणमध्ये आले. यावेळी कल्याणमध्ये स्वराज्याच्या आरमाराची स्थापना झाली. यावेळी त्यांनी ताब्यात घेतलेली गलबते व होड्या हे स्वराज्याचे पहिले आरमार होय. हे स्वराज्याचे पहिले आरमार प्रथम कल्याणच्या खाडीत तरंगले हे येथे आवर्जून नमूद केले पाहिजे. त्याचवेळी कल्याण येथेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरखेल किंवा नौदलप्रमुख म्हणून दर्यासारंगाची नेमणूक केली. त्याचप्रमाणे इब्राहिमखान, दौलतखान व मायनाक भंडारी हे अत्यंत शूर, धाडसी व निष्ठावंत अधिकारी आरमारात सामील केले.
खाडीच्या किनाऱ्यावर एका टेकाडावर दुर्गाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या चारही बाजू उपदिशांना म्हणजेच आग्नेय, नैऋत्य, वायव्य व ईशान्य या दिशांना अभिमुख आहेत. चार कोपऱ्यात चार बुरुज व पूर्व कोपऱ्यातील बुरुजालगत असलेला आणखी एक बुरुज, या दोन बुरुजांमध्ये असलेले महाद्वार व काहीसा आयताकार तलविन्यास असलेला बाह्यकोट असे या किल्ल्याचे स्वरुप आहे.
आतील भागात चौकोनी तलविन्यासाचे एक पीठ असून त्यावर देवीचे मंदिर आहे. हे देवीचे मंदिर आग्नेयाभिमुख आहे. (आजच्या अत्याधुनिक चुंबकीय सुईने जरी आग्नेय दिशा सूचित केली असली तरी किल्ला व मंदिर बांधले गेले त्यावेळी दिशासाधन सूर्याच्या दिशेवरुन केले जात असे. त्यामुळेच उत्तरायण व दक्षिणायनाच्या काळात सूर्योदयाची दिशा सतत बदलती असल्यामुळे चुंबकीय सुईने दाखवलेली आग्नेय दिशा किल्ला व मंदिर बांधले गेले त्या काळात पूर्व मानली गेली असण्याची दाट शक्यता आहे.) या मंदिराच्यामागे मंदिराच्या पीठाच्या साधारणपणे निम्म्या उंचीचे आणखी एक लंबआयताकार पीठ असून त्यावर इदगाह आहे.
किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी जाड असून बांधकाम मजबूत होते असे दिसते. तथापि बुरुजावरील व तटांवरील मूळ कठडे आज शिल्लक नाहीत. त्यामुळे तोफांच्या खाचा व गोळीबार गवाक्षे होती की नव्हती, अथवा असल्यास कोणत्या ठिकाणी होती ते कळण्यास मार्ग नाही. किल्ल्याच्या अंतर्भागातील जमिनीची पातळी तटाइतकीच उंच आहे. किल्ल्याच्या अंतर्भागाच्या जमिनीची पातळी वायव्येकडून आग्नेयेकडे कललेली, म्हणजेच उताराची आहे.
किल्ल्याचे बुरुज सर्वसाधारणपणे वर्तुळाकृती तलविन्यासाचे आहेत. यातील एका बुरुजाचे काही प्रमाणात नुतनीकरण झाले असून त्यावर रंगरंगोटी व कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराचे कठडे उभारण्यात आले आहेत. एका बाजूचा बुरुज मधूनच ढासळला आहे. बाकीचे दोन बुरुज कठडे नसलेल्या स्थितीत पण बऱ्यापैकी टिकून आहेत.
किल्ल्याच्या आग्नेय तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे. या प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते कळण्यास मार्ग नाही. याच तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे. या प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते कळण्यास मार्ग नाही.
किल्ल्याच्या अंतर्भागात मंदिराचे एक व इदगाहाचे एक अशी दोन पीठे असली तरी या पीठांनी बालेकिल्ला बनला नव्हता; म्हणजेच निराळ्या शब्दात या किल्ल्याला आत बालेकिल्ला नव्हता हे निश्चित. किल्ल्यामध्ये एक इदगाह व एक देवीचे मंदिर एवढ्या दोनच जुन्या वास्तू आहेत. मंदिराचे अलिकडेच नुतनीकरण झाले आहे. हे नुतनीकरण मूळ मंदिरानुसारच करण्यात आले (म्हणजे निदान त्याचा तलविन्यास तरी मूळ मंदिरानुसारच ठेवण्यात आला) असे सांगण्यात येते. या मंदिरात आजही पूजाअर्चा होते. दर नवरात्रीत येथे मोठा उत्सव होतो व देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात.
दुर्गाडी किल्ला जलदुर्ग असला तरी वसईच्या किल्ल्याप्रमाणे खाडीतून थेट किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मार्ग नाही. निराळ्या शब्दात नौदलाच्या सहाय्याने या किल्ल्याची कुमक करता येईल अशी परिस्थिती नव्हती. हा किल्ला मराठ्यांनी बांधला असल्यामुळे आणि किल्ल्याच्या निर्मितीच्यावेळी लगतचा प्रांत मराठ्यांच्याच ताब्यात असल्यामुळे तशी सोय असण्याची फारशी गरजही नव्हती.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे नौदल स्थापन करायचे होते. आपले नौदल कसे असावे याबाबतचे शिवछत्रपतीचे विचार अगदी स्पष्ट होते. स्वराज्याचे शेजारी म्हणून पोर्तुगीज, इंग्रज यांच्यासारखे दर्यावर्दी लोक होते. त्यांचा दर्यावर्दी अनुभव व तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे याची महाराजांना कल्पना होती. म्हणून आपले आरमार त्यांच्या बरोबरीचे किंवा तोडीचे नसले तरी अधिक वेगवान असावे, शत्रूचे मोठे आरमार चालून आले तर त्यांची जहाजे आत शिरु शकणार नाहीत अशा खाड्यांमध्ये आपल्या जहाजांना लपता आले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्या दृष्टीकोनातून दुर्गाडीचा किल्ला लष्करीदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी होता असेच म्हणावे लागेल.
किल्ल्याची नैऋत्यकडील तटबंदी पडून गेली असून तिचा पायाच फक्त शिल्लक आहे. तटबंदीचे व बुरुजांचे कठडे आणि महाद्वार पडून गेले आहे. तथापि सर्वसाधारणपणे किल्ल्याची कल्पना येईल इतपत अवशेष आजही टिकून आहेत. हा किल्ला तसा छोटेखानी असला तरी स्वराज्याचा पहिला आरमारी तळ म्हणून या किल्ल्याचे महत्व अपरंपार आहे.
संकलन - विलास सागवेकर,
वाड्यांच्या या समृद्ध शहराचा इतिहास आपल्याला शिवरायांच्याही भूतकाळात घेऊन जातो. शिवरायांनी या शहराचे भौगोलिक महत्त्व ओळखून याला मराठा साम्र्याज्यातील एक बंदर म्हणून नावारूपास आणलं होतं.दुर्गाडी किल्ला आणि काळा तलाव अजूनही या समृद्ध इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. या दुर्गाडी किल्ल्यावरची दुर्गा देवी ही कल्याणची आराध्य देवता. आणि अजून एक वैशिष्ठ्य सांगायचं म्हणलं तर प्रत्येक शहर किंवा गावामध्ये आता दुरापास्त झालेलं एका काळातील प्रसिद्ध वाहतुकीचं साधन म्हणजे घोडागाडी किंवा टांगा हे आजही कल्याणाच्या रस्त्यावर त्यांचा थाट कायम ठेवून आहे.

दुर्गा देवीच्या स्थापनेपासूनच्या काळातून थोडंसं पुढे आलं की आपण येतो ‘ वाडे संस्कृती’त. सुभेदार वाडा, वैद्य वाडा, जोग वाडा अश्या अनेक वाड्यांनी या शहराच्या संस्कृतीचा पाया घातला.यातील सुभेदार वाड्यापासून दुर्गाडी किल्ल्यापर्यंत गेलेलं भुयार हे आजही एक आश्चर्य त्या काळातील लोकांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना. टिळकांनी सुरु केलेले ‘मेळ्याचे गणपती‘ (एकादशीला निरोप घेणारे) आजही कल्याणचं वेगळेपण ठळकपणे दर्शवतात.दसऱ्याला आणि गुढीपाडव्याला होणारी स्वागतयात्रा आणि या यात्रेत होणारा ढोलाचा नाद आणि लेझीमची प्रात्यक्षिकं म्हणजे पर्वणीच.
कल्याण या शहराने आजवर अनेक हिऱ्यांना जन्म दिला. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, पहिल्या महिला छायाचित्रकार राधाबाई वैद्य, आणि सर्वप्रथम हलत्या चित्रांचा प्रयोग यशस्वीपणे राबवणारे आणि ‘शाम्भरीक खरोलिका’ या कृष्णाजीवनावर आधारित चलचित्र प्रयोगाचे जनक महादेव पटवर्धन ही अशीच काही मूर्तिमंत उदाहरणं.
९व्या शतकातील लोणादित्य रामेश्वर मंदिर (LONADITYA RAMESHWAR TEMPLE)
अंबरनाथला राहत असल्यामुळे आमच्याकडे पुरातन काळातील एक शिवमंदिर आहे हे आम्ही खूप अभिमानाने सांगत असू पण एका वृत्तपत्रात आलेल्या माहितीत वाचल्यावर लक्षात आलं कि शिलाहार राजांनी बांधलेली अनेक शिवमंदिरे ठाणे जिल्ह्यात अवशेष रूपाने आजही उभी आहेत. या मंदिरापैकी सर्वाधिक अवशेष रूपाने आपले अस्तित्व प्रकट करणारे लोनाडचे लोणादित्य महादेवाचे देवालय होय. अंबरनाथच्या शिवमंदिराच्या शे-पाउणशे वर्षांपूर्वी ह्या देवालयाची निर्मिती झाली. हे वाचलं आणि कल्याण पासून सुमारे ७ किमी दूर असणाऱ्या ह्या "लोणादित्य रामेश्वर" (LONADITYA RAMESHWAR TEMPLE) मंदिरास भेट देण्यास निघालो.




लोनाड - बौद्ध लेणी
लेणी हा शब्द ‘लयन’ (खोदून केलेली गुहा) या संस्कृत शब्दावरून रूढ झाला आहे.
आपल्या भारतात एकूण बाराशे लेणी आहेत. बाराशे लेण्यांपैकी आठशे फक्त महाराष्ट्रातच आहेत. महाराष्ट्रात विपुलतेने मिळणारा बेसाल्ट हा अग्निजन्य दगड हे त्याचे एक कारण आहे. बौद्ध भिक्षूंमुळे महाराष्ट्रात लेण्यांची परंपरा निर्माण झाली.
दक्षिण बिहारमध्ये किंवा प्राचीन काळातील मगध प्रांतामध्ये प्रथम बुद्धाच्या समकालीन आणि थोड्या नजिकच्या काळामध्ये आजीवक नावाचा पंथ होता. त्या पंथातील लोक संन्यस्त होते. ते वनामध्ये वास्तव्य करत. वर्षभर ते भ्रमंती करत. पण पावसाळ्यात मानवी वस्तीपासून दूर त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून अजातशत्रू राजाने पहिली लेणी तयार करून घेतली. त्या लेण्यांना ‘वर्षावास’ असे म्हटले जात असे. नंतर ती सांस्कृतिक केंद्रे बनली. महाराष्ट्रातील लेणी खोदण्याची जी परंपरा आहे ती बिहारमधील नागार्जुन टेकड्या किंवा लोमेश ऋषींची लेणी किंवा सोनभांडार या जांभा दगडातील लेण्यांच्या समुहाशी साधर्म्य असणारी आहे.
कल्याणजवळील 'लोनाड' येथील लेणी गेली १५०० वर्षे निसर्गाशी लढा देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देत उभी आहेत.
लोनाड लेण्यांचे वर्णन इतिहासकार 'एक अपूर्ण राहिलेले अजंठा' असे करतात.
हि लेणी इ स सन ५ ते ७ व्या शतकात कोकणचे मौर्य राजे यांच्या काळात कोरण्यात आली आहेत.
भारतातील लेण्यांची विभागणी साधारण बौद्ध गुंफा, ब्राह्मण गुंफा आणि जैन गुंफा असे करण्यात येते.
लोनाडची लेणी हि जेव्हा १८७५ मध्ये सिनक्लेअर या अधिकाऱ्याने शोधली तेव्हा बाह्य स्वरूपावरून या लेण्याचे वर्गीकरण ब्राह्मण गुंफा असे करण्यात आले.
परंतु अधिक अभ्यासानंतर हि लेणी बौद्ध गुंफा आहेत असे दिसून आले.
लोनाडच्या लेण्यांमध्ये अनेक जातककथा सुबकरीत्या शिल्पपट्टिकांमध्ये कोरण्यात आली आहेत.
जातक कथांचे माहिती आणि लेण्याचे वर्णन पुढील लेखात...
लोनाड शिल्पपट्टिका क्र. १
सिनक्लेअर यांची नोंद:
next the well, contains a man seated on a square throne, left leg curled in front of
him, left hand resting on left knee. Right hand raised, as if to enforce his discourse, holds a
fruit or flower (lotus?). Woman standing to his right, two destroyed figures to left.
मराठी अनुवाद :
पाण्याच्या टाकीच्या बाजूला असलेल्या पहिल्या शिल्पात एक व्यक्ती चौकोनी सिंहासनावर डावा पाय दुमडून बसला आहे.
त्याचा डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवला आहे. उजवा हात आज्ञा देण्यासाठी वर उचलला आहे. उजव्या हातात बहुदा फळ किव्वा फुल आहे.
त्याच्या उजवीकडे एक स्त्री उभी आहे तर डावीकडील दोन व्यक्तींशिल्पांची स्थिती खूप वाईट आहे.
अर्थ :
विश्वंतरची आई फुसती/माया हि एक पूर्वजन्मीची राजकुमारी होती. तिने अनेक महान धार्मिक केली त्यामुळे तिचा पुढचा जन्म हा स्वर्गातील इंद्राची राणी म्हणून झाला. जेव्हा तिचा स्वर्गातील काळ संपत आला, तेव्हा इंद्राने तिला दहा वरदान दिले. तेव्हा तिने मानवरूपात बोधिसत्वची आई बनण्याचे वरदान मिळवले. शिल्पपट्टिकातील प्रसंग हा इंद्र राणी फुसती/मायाला 'कर्माचे फ़ळ' म्हणून बुद्धाची आई होण्याचे वरदान देतानाचा आहे
लोनाड लेणी - शिल्पपट्टिका आणि जातककथा
भारतातील लेणी हि सामाजिक आणि सांस्कृतिक समरसतेचे प्रतीक आहेत. भारतातील अनेक लेणी हि वेगवेगळ्या पंथीयांच्या शिल्पकलेच्या प्रेरणेचा परिपाक आहेत. उदाहरणार्थ कार्ल्याच्या लेण्यांचा प्रमुख भाग हे हीनयान पंथीय आहे, पण त्याचा बाहेरील भाग हा महायानपंथीय आहे. कान्हेरीचा क्रमांक तीनचा स्तूप हा मूळचा हीनयान आहे पण नंतर महायानांनी त्यावर काम केले. या लेण्यामधून जशी पंथसहिष्णुता अधोरेखित होते त्याचप्रमाणे त्याकाळातील समाजाची सामाजिक जाणिव देखील दर्शित होते. भारतातील बहुतेक लेणी हि राजांनी किंवा त्यांच्या मंत्र्यांनी बांधलेल्या नसून लोकांनी त्यांच्याकडील पै पै दान देऊन बांधली आहेत. कल्याण येथिल व्यापाऱयांनी लेण्यांसाठी दिलेल्या देणगीचे उल्लेख कान्हेरी, कार्ले येथे पाहायला मिळतात.
लोणाडची लेणी जानेवारी १८७५ मध्ये सिनक्लेअर या अधिकाऱ्याने स्थानिक लोकांच्या मदतीने शोधली व या लेण्यावरील शोध निबंध प्रकाशित केला. पुढे डॉ. बर्गीस यांनी देखील १८८० मध्ये आधी प्रकाशित माहितीवरून अधिक अभ्यास करून शोध निबंध प्रकाशित केला. परंतु त्यानंतर १४० वर्षात या लेण्यांची अपेक्षित इतकी निगा राखली गेली नाही. आज या लेण्याच्या अधिक माहितीसाठी सिनक्लेअर यांच्या त्या काळातील नोंदीची मदत घ्यावी लागते.
या लेण्याच्या द्वारमंडपाला चार खांब असून मधला खांब तुटलेला आहे. या खांबाच्या पडझडीतूनच द्वारमंडपाच्या वर असलेल्या शिल्पपट्टिकांची वाताहत झाली आहे. ओसरी ४८x१० फूट आहे. पुढे गाभाऱ्यात जाण्यासाठी ३ दरवाजे आहेत. विहारात शिरतानाच डावीकडे ८ फूट खोल पाण्याची टाकी आहे. सिनक्लेअर यांच्या प्रबंधामध्ये अशी नोंद आहे कि स्थानिकांचा अनुभव असा आहे कि जवळील उल्हास नदीच्या भरती-ओहोटीच्या वेळेतील पाण्याच्या कमी अधिक पातळीप्रमाणे या डोहातील पाण्याची पातळी कमीअधिक होते.
द्वारमंडपाच्या वरील बाजूस १७ शीलपट्टीका कोरण्यात आल्या असून त्या १ ते २ फूट कमी-अधिक असमान रुंदीच्या आहेत. उजवीकडे एक ५ फुटाचे सुंदर शिलप कोरण्यात आले आहे. या शिल्पांमधून 'वेसंतर' या गौतम बुद्धांच्या एका पूर्वजन्माची कथा सांगणाऱ्या प्रसिद्ध जातककथेतील प्रसंग कोरण्यात आले आहे. याचप्रमाणे एकाच कथेला वाहून घेतलेले हे भारतातील एकमेव लेणे. शिल्पपट्टिका या कथेतील कोणता प्रसंग चित्रित करतात हे आपण पुढील लेखात बघू. पण तत्पूर्वी वेसंतर हि जातक कथा संक्षिप्त मध्ये पाहू.
वेसंतर हा सिवी राज्याच्या संजय नामक राजांचा पुत्र. जन्मत:च तो बोलू लागला होता. लहानपणापासूनच आपल्या दान, शील, सत्य या गुणांमुळे त्याची प्रसिद्धी चहूकडे पाहोचते. लग्नानंतर त्याला दोन पुत्र प्राप्त होतात. वेसंतरकडे पाऊस पडू शकणारा सफेद हत्ती असतो. कलिंग देशात दुष्काळ पडल्याने तेथील काही लोक हा हत्ती मागण्यासाठी वेसंतरकडे येतात. वेसंतर त्यांना हत्तीचे दान करून टाकतो. यामुळे सिवी राज्याची प्रजा चिडते. प्रजेच्या मागणीमुळे संजय राजा वेसंतरला हद्दपारीची शिक्षा सुनावतो. एक मोठे दानसत्र पार पाडून पत्नी व दोन मुलांसह रथात बसून तो बाहेर पडतो. वाटेत काही ब्राह्मणांनी घोडे व रथही मागून घेतल्यामुळे पदयात्रा सुरू होते. ते वनात राहतात. फळे, कंदमुळे गोळा करणे, पाणी भरणे वगैरे कामे पत्नीच करते. मग एक म्हातारा ब्राह्मण आपल्या तरुण पत्नीच्या सेवेसाठी दोन्ही मुलांना मागून घेतो. वेसंतर त्याचेही दान करतो. पत्नीला याचे दु:ख झाले तरी ती नव-याच्या दातृत्वाचे समर्थन करते. अखेर इंद्र स्वत: ब्राह्मणाच्या रूपात येऊन पत्नीचे दान मागतो. पत्नीच्या संमतीने वेसंतर त्यालाही तयार होतो. येथे दानपारमितेची सत्त्वपरीक्षा पूर्ण होते. इंद्र प्रकट होतो. वेसंतराला वर देतो. मग सर्व प्रश्न सुटतात. शेवट व्हायला तेवढा गोड होता. सिवी राज्यात सर्व एकत्र जमतात. वेसंतराचा राज्याभिषेक होतो. नंतर तो दानच करत राहतो व अखेर तुशित नामक स्वर्गात जातो.
कल्याणचे पेशवेकालीन महालक्ष्मी मंदिर
गेली अनेक वर्षे नवरात्रोत्सवादरम्यान कल्याणच्या टिळक चौैकमधील महालक्ष्मी देवीचे मंदिर कल्याणकरांसाठी आकर्षण बिंदू ठरला आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून कल्याणच्या महालक्ष्मी देवीला ओळखले जाते
महालक्ष्मी देवीचे हे मंदिर पेशवकालीन आहे, असे जाणकार सांगतात. कर्जत, कसारा ते थेट मुंबईपासून भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. ठाण्याच्या कलेक्टरेट गॅझेटमध्ये हे मंदिर १८०१मध्ये उभारल्याची नोंद आहे. काहींच्या मते मुघल साम्राज्याच्या दरम्यान मंदिराला नुकसान पोहोचू नये, यासाठी मंदिर कौलारू बांधण्यात आले.
मोहन पिंपळखरे आणि माधव पिंपळखरे यांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधले असून सध्या या मंदिराची देखरेख ट्रस्ट करत आहे. नवरात्रात भारुड, किर्तन असे विविध कार्यक्रम केले जातात. तसेच अष्टमीला घागर फुंकण्याचा कार्यक्रम केला जातो. नवारात्रात रंगानुसार मंदिरात फुलांची सजावट केली जात असते. तसेच, दिवसातून तीनदा आरती केली जाते.
अतिशय साध्या आणि शांततेने नवरात्रोत्सव साजरा करण्याचा या मंदिराचा प्रयत्न असतो. देवीला वाहण्यात येणारे तांदूळ आणि साडी वनवासी कल्याण आश्रमात दिले जाते. तसेच, वर्षभरात मंदिरात जमा होणाऱ्या निधीतील ठराविक रक्कम जव्हार, मोखाडा आदिवासी भागातील जनतेसाठी दिली जाते.
माहिती स्त्रोत - मटा
लोकमान्य टिळकांची कल्याण भेट - २३-ऑगस्ट-१९०६
कल्याण शहराला जी सामाजिक, सांस्कृतिक आणि संस्थात्मक परंपरा लाभलेली आहे, त्या परंपरेचाच एक भाग म्हणजे कल्याणमध्ये साजरे होणारे सार्वजनिक गणेशोत्सव. लोकमान्यांनी पुण्यात १८९३ या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रथम सुरुवात केली. जाती-जातींमध्ये विखुरला गेलेला हिंदू समाज एकत्र यावा, गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजप्रबोधन व्हावे, त्याकाळी देश पारतंत्र्यात असल्याने नागरिकांच्या मनात देश, धर्म, स्वातंत्र्य याबद्दल अभिमान व प्रेम निर्माण व्हावे, गणेशोत्सवाच्या निमित्याने समाजाने एकत्र येऊन स्वराज्याच्या लढ्यासाठी त्याचा प्रभावी शस्त्र म्हणून वापर करता यावा, या उदात्त हेतूंनी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर लगेचच पुढील दोन वर्षांनी म्हणजे १८९५ या वर्षी लोकमान्यांच्याच प्रेरणेने कल्याणमधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९५ या वर्षी सुभेदार वाडा या ऐतिहासिक वास्तूत झाली. गेल्याच वर्षी या गणेशोत्सवाने शतकोत्तर रौप्य महोत्सव दिमाखदाररित्या साजरा केला. या गणेशोत्सवास १८९५ या वर्षी प्रारंभ झाल्यापासून उत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कल्याणात येऊन उत्सव पाहून त्यांस आशीर्वाद द्यावा, अशी सर्वांची फार इच्छा होती. हा योग १९०६ या वर्षी जुळून आला. त्या वर्षी मात्र लोकमान्यांनी कल्याणकरांचे आमंत्रण स्वीकारून व उत्सवप्रसंगी हजर राहून कल्याणकरांना धन्य केले.
२३-ऑगस्ट-१९०६ रोजी गणेशोत्सवाकरिता लोकमान्य कल्याण येथे आले तेव्हा त्यांचे उचित असे स्वागत कल्याणकरांनी केले. राजेरजवाड्यांच्या मिरवणुकीचे वर्णन आपण वाचतो, पण या मिरवणुकींचे वर्णन फिक्के पडेल असा अपूर्व थाट लोकमान्यांच्या आगमन मिरवणुकीचा होता. दिवाळीतदेखील होणार नाही, असा दीपोत्सव कल्याणकरांनी लोकमान्यांच्या सन्मानार्थ मोठ्या आनंदाने केला. या प्रसंगाचे वर्णन ‘अरुणोदय परशुराम’च्या अंकात नमूद केलेले आहे. लोकमान्यांचे कल्याणच्या रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यासाठी सुमारे दीड हजारांनी जनसमुदाय जमला होता. ठाणे जिल्ह्यातल्या विविध गावांमधून नागरिक आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आले होते. रेल्वे गाडी स्थानकात येताच, शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांच्या नावांचा जयजयकार झाला. लोकमान्यांच्या मिरवणुकीला स्थानकावरून प्रारंभ झाला. मिरवणुकीत प्रचंड जनसमुदाय सामील झाला. काही अंतर गेल्यावर काही जणांनी मिरवणुकीच्या गाडीचा घोडा सोडून गाडी भारताचार्य चिंतामण राव वैद्य यांच्या घरापर्यंत स्वतः ओढून नेली.
सुभेदार वाड्यात लोकमान्यांचे आगमन होताना नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारल्या होत्या. रांगोळ्या काढल्या होत्या, तसेच दीपोत्सव केला होता. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, समर्थ रामदास स्वामी, वंदे मातरम्, स्वातंत्र्यदेवी यांच्या नावांचा जयघोष चालला होता. लोकमान्यांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. गणेशोत्सवातील लोकमान्यांच्या सभेचे अध्यक्षस्थान भारताचार्य चिंतामण राव वैद्य यांनी स्वीकारले होते. भारताचार्य वैद्य यांनी प्रास्ताविक भाषण करून लोकमान्यांना भाषण करण्याची विनंती केली. टाळ्यांच्या कडकडाटात लोकमान्यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला. लोकमान्य म्हणाले, “राष्ट्र कितीही गरीब वा श्रीमंत असो, कितीही दरिद्री असो, कितीही परतंत्र असो, पण त्याला उत्सव माहिती नसेल तर ते राष्ट्र पशूच होय. वर्षातून एक दिवस तरी असा पाहिजे की त्या दिवशी संसाराची दगदग बाजूला ठेऊन माणसाने आपली सर्व तर्हेने स्थिती कशी आहे याचा विचार करावा. राष्ट्रात जागृती होणे फार महत्त्वाचे आहे. आपणामध्ये एकराष्ट्रीयतवाची कल्पना नव्हती, त्यामुळे आमची अशी दशा झाली आहे, मनुष्य नराचा नारायण होईल हे तत्त्व आमच्या धर्माइतके स्पष्ट कोणत्याच धर्मात सांगितले नाही. इतके सामर्थ्यवान आपण असताना हे सामर्थ्य आपणांस समजत नाही, हा आपला दोष आहे. काळ हा व्यापक आहे. त्याचा फायदा घेऊन आपण पुढे जाऊ लागलो, तर पाऊल लवकरच पुढे पडेल. शरीराप्रमाणे आपली मनेही स्वदेशी झाली पाहिजेत. आपण स्वदेशीच आहोत. त्यामुळे स्वदेशी विचारांची दृष्टी सदैव आपल्या अंतःकरणात झाली पाहिजे. ”राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या लोकमान्यांच्या या भाषणाने उपस्थित जनसमुदाय कृतकृत्य झाला. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १९९४ साली झालेल्या शतक महोत्सवी वर्षाच्या, तसेच २०१९ साली झालेल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या आगमन मिरवणुकीत लोकमान्यांचा देखावा आयोजित करण्यात आला होता.
चले जाव आंदोलन आणि कल्याण
८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेस अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी भारतभर नागरी असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला. महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले. कल्याणकरांनी कधी वैयक्तिक सत्याग्रह किव्वा कधी सामूहिक आंदोलनात सहभागी होऊन भारताच्या स्वातंत्रलढ्यात प्रत्येक पावलावर ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्यात मदत केली. कांजी गोविंद करसन यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात २००० कल्याणकारांसह सत्याग्रह आणि युद्धविरोधी घोषणा या स्वरूपाचे आंदोलन केले. रामभाऊ पटवर्धन यांनी जपानच्या युद्धरुपी जाळ्यात अडकलेला ब्रिटिशरूपी सिंह आणि त्याची भारतीयांकडून मुक्तता असे उपहासात्मक व्यंगचित्र काढून निषेध नोंदवला. प्रभातफेर्या, बुलेटिन वाटप, खादी प्रसार, स्वातंत्रदिन साजरा करणे असे अनेक कार्यक्रम करून ब्रिटीशराज विरुद्ध एक असे चैतन्यपूर् वातावरण कल्याणमध्ये होते. वंदे मातरम घोषणांनी अनेक परिसर दुमदुमायचे. टिळक चौक येथील पोलीस चौकी जाळण्याचा देखील प्रयत्न झाला. अनेक कार्यकर्त्यांना यामुळे अटक होऊन अनेक वर्ष तुरुंगवासदेखील झाला. लष्कराला देखील कल्याणमध्ये काही काळ पाचारण करण्यात आले होते. एकंदरीत कल्याणकरांनी स्वातंत्रलढ्यात झोकून देऊन पुढच्या अनेक पिढींसाठी आदर्श निर्माण केला. आजचा दिवस हा कल्याणकरांच्या अशा कामगिरीच्या आणि एकंदरीत वाटचालीच्या स्मरणार्थ साजरा करण्याचा.
१ मे १८५४:- रेल्वेचा कल्याण स्पर्श
आजच्याच दिवशी १६५ वर्षांपूर्वी दिवशी आपली कल्याणनगरी जगाशी रेल्वे मार्फत जोडण्यात आली.
जॉर्ज स्टीफनसन याने २५ जुलै १८१४ साली वाफेच्या इंजिनाचा प्रयोग सिद्ध करून दाखवला. त्यानेच २७ सप्टेंबर १८२५ ला ताशी १२ मैल वेगाने धावणारी पहिली रेल्वेगाडी जगाला धावून दाखवून दिली. पुढे १५ सप्टेंबर १८३० साली जगात पहिल्यांदा सर्वसामान्य जनतेसाठी रेल्वेगाडी धावली ती मँचेस्टर ते लिव्हरपूल मध्ये. १८४० पर्यंत संपूर्ण युरोप मध्ये रेल्वेचे जाळे विणले गेले होते. त्याचा परिणाम वाढते औद्योगिकीकरण, वाढते उत्पादन, वाढणारे ग्राहकत्व या स्वरूपात दिसत होता.
त्याच धरतीवर आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबई येथे आणण्याचा विचार मुंबईचा मुख्य अभियंता जॉर्ज क्लार्क याच्या डोक्यात आला. १३ जुलै १८४४ ला मुंबईत सभा होऊन 'बॉम्बे ग्रेट ईस्टर्न रेल्वे' हि कंपनी स्थापन होऊन मुंबई ते बोरघाट ठाणामार्गे रेल्वे जाईल असे घोषित करण्यात आले. हे सर्व होत असताना इंग्लंड मधील श्रीमंत उद्योजक काही स्वस्थ बसणारे नव्हते. त्यांनी 'GIPR /ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वे' या कंपनीची स्थापना करून आपल्या प्रतिनिधीला भारतात पाठवले व आपले राजकीय वजन वापरून दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे काम करावे अशा सूचना दिल्या.
मुंबई ते बोरघाट हा मार्ग सोपा निश्चितच नव्हता. सायन जवळील भागात दलदल होती, मुंब्राजवळ खाडीवर पूल बांधावा लागणार होता, पारसिक डोंगरामध्ये बोगदा काढावा लागणार होता. परंतु सर्व अडचणींवर मत करत हा प्रकल्प आधी ठरवलेल्या खर्चाच्या २०% कमी पैश्यात झाला.
जगात पहिली रेल्वे सुरु झाल्यावर केवळ २४ वर्षातच आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे मार्गावर धावली. भारतातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला मुंबई – ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यांनतर एका वर्षातच १ मे १८५४ रोजी रेल्वेने आपल्या कल्याणनगरीत प्रवेश केला. मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० युरोपिअन आणि स्थानिक नागरिकांसमवेत हा कल्याणचा आगगाडी दौरा पूर्ण केला.. सायंकाळी ४ वाजून ५० मिनीटांनी बोरीबंदर स्थानकावरुन सुटलेली ही गाडी १ तास १० मिनीटांचा प्रवास करुन सायंकाळी ६ वाजता कल्याणला पोहोचली. कल्याण स्टेशनपर्यंत ही गाडी नेण्यात आली नाही तर स्टेशनच्या आधी खाडीकिनार्यालगत गाडी थांबवण्यात आली. येथेच सैनिकी बॅन्डपथकाने बॅन्डची सलामी दिली. मेजवानी देखील येथेच देण्यात आली. कल्याणपर्यंत रेल्वे धावली या आनंदाप्रित्यर्थ फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. तीन तासाच्या मनोरंजनानंतर जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजता परतीच्या प्रवासाला निघालेली गाडी रात्री अकरा वाजता बोरीबंदरला परत पोहोचली.
हि भारतीय रेल्वे हा फक्त वाहतूक क्षेत्रातील घटना नसून भारताच्या सर्वांगीण इतिहासावर याची चांगली-वाईट छाप आहे. रेल्वेचा विकास आणि बाजूला मुंबईची पहिली कापडगिरणी किव्वा गिरणगावाचा पाया, तेथील मराठी संस्कृती यांनी मुंबईच्या आणि भारताच्या इतिहासाला एक वळण दिले.कल्याणचे म्हणायचे तर रेल्वे आल्यानंतर दुसऱ्याच वर्षी १ नोव्हेंबर १८५५ रोजी कल्याणमध्ये नगर पालिकेची स्थापना करण्यात आली.
आणि जाता जाता संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनेक परिषदांची कल्याण आणि कल्याणकर साक्षीदार आहेत. त्याविषयी सविस्तरमध्ये पुढे बघूच. पण कल्याणला औद्योगिकीकरणाशी जोडणाऱ्या आणि मुंबईला महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आजच्या दिवशी 'मी कल्याणकर' तर्फे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
गणेश घोळ मंदिर - Ganesh Ghol Mandir
शिळफाटा म्हंटल की खिडकाळेश्वाराचं पुरातन मंदिर किंवा अगदी शिळफाट्यावर वसलेलं दत्ताचं मंदिर ही चांगली माहितीतली मंदिर आहेत पण शिळफाट्या समोर दिसणाऱ्या टेकडीवर निसर्ग रम्य अश्या वातावरणात एक गणेशाचं सुंदर मंदिर ही आहे हे नेहमी त्या रस्त्याने जाणार्यांना फारतर माहिती आहे.
पावसाळ्यात हिरवागार होणारा हा परिसर हिवाळ्याच्या मध्यापर्यंत तसाच असतो. रानफुलं, हिरवीगार झाडं आणि ह्या सगळ्याच्या मध्ये वसलेलं टेकडीवरच हे एक लहानसं मंदिर नक्कीच भेट द्यावं असं आहे. पावसाचा जोर चांगला असेल तर जिथून टेकडी चढायला सुरुवात करतो त्याच्या थोडं डावीकडे पाण्याचा एक जोरदार ओहाळ बघायला आणि इच्छा असेल तर डुंबायला मिळतो.
शिळफाट्याला डोंबिवलीकडून आलो की डावा रस्ता पनवेल कडे, उजवा रस्ता मुब्र्याकडे आणि एक रस्ता समोर टेकडीवर जातो जो पुढे महापे मार्गे वाशीकडे जातो ह्या रस्त्यावर टेकडीचा अर्धा चढ गाडीने गेलो की डाव्याबाजूला काही वेळाने टेकडीवर जाणारे जिने दिसतात हेच तुम्हाला गणेश घोळ मंदिराकडे नेतात .
साधारण १४०-१५० स्टेपस आहेत पण दमावणाऱ्या नाहीत. साधारण १०-१५ मिनिटात तुम्ही ह्या मंदिरापर्यंत येऊन पोचतात. मंदिराचा परिसर स्वच्छ आहे आणि मंदिराची देखरेख , पूजा अर्चा करण्यासाठी एक महाराज मंदिरासमोर घर बांधून राहतात. परिसरात फुलझाड लावलेली असल्याने परिसर प्रसन्न वाटतो. एका खूप जुन्या वडाच्या झाडावर एक झोपडी बनवली आहे जिथे शिडीने जावं लागतं. नुकत्याच झालेल्या कुठल्याश्या एका सोहळ्यासाठी होम कुंड , हवन मंडप आणि काही लाकडाच्या झोपड्याही बनवल्या आहेत. बहुदा एखाद्या साधू चा आश्रम असावा
मंदिराकडे नेणारा रस्ता नागमोडा आहे आणि परिसर हिरवागार असल्याने खूप प्रसन्न वाटत. मंदिरात दगडाला शेंदूर फासून एक नैसर्गिक मूर्ती आणि एक गणरायाची नवीन मूर्ती अश्या दोन मुर्त्या आहेत. मंदिर एका मोठ्ठ्या दगडाच्या खोबणीमध्ये वसवलं आहे. ह्या टेकडीवरून आजूबाजूचा परिसर ही मस्त दिसतो. पावसाळ्यात मनमुराद भिजत जायला डोंबिवली जवळचा हा एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. हिवाळ्यात ही भरपूर पक्षी, रानफुलं आणि हिरवागार निसर्ग आपलं स्वागत करतच जणू इथे उभा असतो.
डोम्बिवली हून कार , दुचाकी किंवा अगदी वाशीकडे जाणाऱ्या बस ने आपण इथे पोहचू शकतो. फत्त कल्याणफाटा ला उतरून १०-१२ मिनिट जास्त चालावं लागतं. इथे यायला भरपूर बसेसची सोय आहे. भरभरून पाउस पडत असल्याने फोटो मोबाईल ने काढले कॅमेरा बाहेर काढायची हिंमत झाली नाही
गुगल नकाश्यामध्ये ह्या मंदिराचं नाव ओंकारेश्वर मंदिर दाखवलं आहे ते बदलायची विनंती गुगल कडे केली आहे
दुर्गाडी
कल्याण शहर म्हणजे शिवपूर्व काळापासून एक प्रमुख बंदर म्हणून प्रसिद्ध होते. शहराच्या संरक्षणार्थ चहुबाजूने तटबंदी, एकूण ११ बुरुज आणि अनेक लहान-मोठे दरवाजे बांधले होते. सन १६५४ साली शिवाजी महाराजांनी भिवंडी, कल्याण हि प्रमुख ठाणी जिंकून घेतली. कल्याण मधून वाहणारी उल्हास नदी थोडे अंतर पुढे जाऊन समुद्राला मिळते. ह्या उल्हास नदीच्या खाडीवर एका छोट्याशा टेकडीवर शिवाजी महाराजांनी किल्ल्याची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली. हि सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून किल्ल्यास दुर्गाडी नाव दिले गेले. किल्ल्यामध्ये आरमाराची गोदी बांधून लढाऊ जहाजबांधणीचा कारखाना सुरु झाला. दुर्गाडी किल्ल्यामध्ये एकूण ३४० पोर्तुगीज कारागीर जहाज बांधणीच्या कामी असल्याची नोंद इतिहासात सापडते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युंनतर १६८२ साली दुर्गाडी किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. हसन अली खान ह्या मोघल सरदाराने कल्याण प्रांत मोघलांना जिंकून दिला मात्र संभाजी महाराजांनी अल्पावधीतच हल्ला करून कल्याण प्रांत परत स्वराज्यात समाविष्ट केला.
आजमितीस किल्ल्याची आधुनिक पद्धतीने डागडुजी झाली आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या
![]() |
| गणेश दरवाजा जवळच गणपति मंदिर |
![]() |
| गणेश दरवाजा |
![]() |
| किल्यावरचे बुरुज |
![]() |
| किल्याची पुरातन विभागाने केलेली डागडुजी |
![]() |
| दुर्गा माता ची सुन्दर मूर्ति |
![]() |
| दुर्गा मातेचे मंदिर |
![]() |
| महाराजांनी बांधलेलं मशीद |
Durgadi is a derived from union of two Marathi words Durga (A Hindu Goddess) and Gaad (Which means 'Fort' in Marathi language). Durgadi Fort is Kalyan city's most adored historical monument, a sacred worshiping place and even a recreation spot for many Kalyankars. Durgadi Fort also called as Durgadi Killa was constructed during Shivaji's Era in honour of hindu deity Mata Durga.
Subscribe to this channel and stay tuned:
दुर्गाडी किल्ला (कल्याण) -
दुर्गाडी किल्ला (कल्याण) -
चौधरपाडा : शिलाहार कालीन पुरातन शिलालेख
समाज एकसंध राहण्यासाठी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात अनेक पुरावशेष कोरलेले पहायला मिळतात . हिंदू-जैन-बुध्द धर्माशी संबंधित शिल्पकला, वीरगळ, गध्देगाळ, शिलालेख, शस्त्रास्त्रे, विविध राजवंशाची नाणी, लघुचित्रे, सिंधूसंस्कृतीशी निगडीत पुरावशेष, प्रसिध्द चित्रकारांची चित्रे इ. अनेक पूर्वेस यात बघायला मिळतात.
सातवाहन, वाकाटक, कलचुरी, राष्ट्रकुट, अभीर इ. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या राजवंशांपैकी अजून एक महत्त्वाचा राजवंश म्हणजे शिलाहार. उपलब्ध शिलालेखांवरून महाराष्ट्रात आणि कर्नाटकात शिलाहारांच्या दहा शाखांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतावर राज्य केले असे दिसून येते. त्यापैकी उत्तर कोकणचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कोल्हापूरचे शिलाहार ह्या तीन प्रमुख शाखा होत्या.हेमाडपंती कलाकृतीची मंदिरे बांधण्याचा प्रभाव यादव, शिलाहार काळापासून आहे.
उत्तर कोकणच्या शिलाहारांचे ठाणे आणि रायगड प्रांतावर राज्य होते आणि त्यांची राजधानी श्रीस्थानक (आताचे ठाणे) होती. ठाणे, कल्याण शहरांच्या आसपास शिलाहारांचा इतिहास उलगडून सांगणारी अनेक दानपत्रे, मंदिरे पहायला मिळतात. भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.
इस ८०० ते १२६५ अशा साडे चार शतकांच्या प्रदीर्घ कालावधीत शिलाहार राजघराण्याने उत्तर कोकण प्रांतावर राज्य केले. या राजघराण्याचा इतिहास समजण्याकरिता या राजांनी दिलेली ताम्रपट आणि शिलालेख स्वरूपातील दानपत्रे अतिशय मूल्यवान आहेत. शिलाहार राजे शिवभक् होते. त्यांनी अप्रतिम भूमिज शैलीतील( पूर्व हेमाडपंती शैली) अनेक शिव मंदिरे बांधली. कल्याण परिसरातच खिडकाळी, लोनाड मधील रामेश्वर/लोणादित्य आणि बापगाव येथील सुम्पेश्वर हि मंदिरे शिलाहार राजांच्या काळातील. विहार येथील अनंतदेव यांची गध्देगळ, भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.
बापगाव येथे माळरानात अनेक वर्षे एक प्राचीन शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडलेला होता. शिलाहार राजा दुसरा केशिदेव याने कोरविलेला हा शिलालेख आता नष्ट झालेल्या सुम्पेश्वर मंदिराबद्दल काही माहिती देतो. इतिहासात इस १८८२ मध्ये ही शीला सापडल्याची नोंद आहे. त्यावरील लेखाचे वाचन पं. भगवानलाल इंद्राजी यांनी केले होते. लेखाची भाषा संस्कृत आणि लिपी नागरी आहे. या लेखात २२ ओळी आहेत.

सिद्धम ।
अर्थ : (सिध्दी असो)
ॐनमो विनायकाय ॥
अर्थ : (विनायकास नमस्कार असो)
नमामि भुवनोत्पत्तिस्थितीसंहारकारीणं(णम्) ॥
अर्थ : (विश्वाची उत्पत्ती, संंधारण व लय यास कारणीभूत असलेला व)
श्रीमत्षुंपेश्वरंभक्तजनसर्वार्त्तिहारीणं ॥१ ॥
अर्थ : (भक्तजनांचे दुःख हरण करणा-या श्रीमत् षुपेंश्वरास नमन असो)
श्रीविद्याधरवंशमंडनमणिर्ज्जीमूतकेतो: कुलेविख्यातोस्त्यपरार्क्कराजतनय (य:) श्रीकेशिपृथ्वीपति: ।
अर्थ : (श्रीविद्याधर वंशाचा भूषणभूत जीमूतकेतूच्या कुळात प्रसिद्ध असलेल्या राजा अपरार्काचा पुत्र पृथ्वीपती केशीदेव)
यस्यापारपवित्रपौरुषनिधेरालोक्य राज्यस्थितिं श्रीरामादिमहिभुजां भगवती धत्तेधरा न स्मृतिं ॥२॥
अर्थ : (ज्याचे पावित्र्य अपार व अवर्णनीय आहे, व ज्याच्या पौरूषत्वाचा संचय अवलोकन करण्यासारखा आहे व ज्याच्या राज्याची समृद्धी श्रीराम आदी पराक्रमी राजांची पृथ्वीदेवतेला स्मरण करून देणारे आहे.
स(श)क संवत् ११६१ विकारीसंवत्सरांतर्गत माघ वदि १४ चतुर्द्द्श्यां भौमे शिवरात्रौ पर्व्वणीअद्येह समस्तराजावलीसमलंकृत महाराजाधिराजकोकणचक्रवर्त्ति श्रीकेशिदेवकल्याणविजयराज्ये तथैतत्प्रसात्समस्तराज्यमंडलचिंताभारं समुद्वहति ।
अर्थ : (शक संवत ११६१ विकारी संवत्सर माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री मंगळवार या दिवशी संपूर्ण राजमंडळाने सुशोभित असलेला महाराजाधिराज कोकणचक्रवर्ती श्रीकेशीदेव ज्यांचे राज्य पराक्रमी व कल्याणदायी आहे, अत्यंत प्रसन्न होऊन जो चिंता वहातो)
महामात्ये श्रीझंपडप्रभु महासांधिविग्र(हि)क राजदेवे पंडित श्रीकरणभांडागारे अनंतप्रभुप्रमुखे(षु) सत्सु एतस्मिन्काले प्रवर्तमाने
सतिब्रह्मपुरीग्रामदानसा(शा)सनं समधिलिक्ष(ख्य)ते यथा ॥
अर्थ : (महामंत्री श्रीझंडप्रभू महासंधीविग्रहक रामदेव पंडित व कोषाध्यक्ष अनंतप्रभू हे ज्याचे प्रमुख मंत्री आहेत त्या ब्रम्हपूरी या गावात हे आज्ञापत्र या काळात लिहिले गेले ते असे)
श्रीषोंपेश्वरदेव पूजनसदाव्यासक्तसर्वा(न्तरः) ।
अर्थ : (श्री षूपेंश्वर देवाच्या पूजाअर्चेत सतत रममाण असलेला)
सत्पात्रद्विज सोमनायकव (ब)टोःसंतानयो(भो)ग्यस्थितिं (तिम्)।
अर्थ : (योग्य सत्पात्र ब्राम्हण सोमनायक यास त्याच्या मुलाबाळांच्या देखभालीसाठी)
श्रीब्र्ह्मपुरीपुरारिभवनक्ष्माभृन्मनोहारिणीं।
अर्थ : (पुरातन काळात शिवाच्या वास्तव्यास योग्य असलेल्या मनोधारिणी ब्रम्हपूरी)
वीर: कारयति स्म विस्मयमयीं श्रीकेशिपृथ्वीपति: ॥३॥
अर्थ : (जेथे शूर केशीदेव पृथ्वीपती विस्मयकारक गोष्टी करण्यात अग्रेसर असे.)
बटुकनामानि कथ्यंन्ते। सोमनायक: सुर्य्यनायक: । गोविंदनायक: । नाऊ नायक:। इति चत्वारो बटुका: ॥
अर्थ : सोमनायक, सूर्यनायक, गोविंदनायक व नावनायक अशी या चार भटांची नावे सांगितली आहेत.)
निर्व्वाहाय पुरारिपूजकबटुश्रेणी द्विजानां सदावो(बो)पग्रामगता स्वसीमसहिता मां(जे/ज)सपल्लीपुरा दत्ता श्रीशिवरात्रि पर्व्वणी विभोषोंपेश्वरस्याग्रत: श्रीमत्केशिनरेश्वरेण विमला चंद्रार्क्कतारावधि॥४॥
अर्थ : (त्या शिवाची पूजा करणा-या बटूक थोर श्रेणी ब्राम्हण बापगावातील त्याच्या निर्वाहासाठी सर्वसीमांतर्गत मांजसपल्ली (वाडी) श्रीकेशीनरेश्वर षुंपेश्वरासमोर यावत् चंद्र दिवाकरौ स्वच्छ चांदण्या रात्री शिवरात्री दान दिला.
(राज्य)स्य मंत्रीणान्यैर्व्वा कर्तव्यं धर्म्मपालनं । धर्मध्वंशे … नरकस्थितिं ॥५॥
अर्थ : (राजमंत्र्यांना या राजपत्राचे पालन करणे हे धर्मपालन करण्यासारखे आहे असे मानले पाहिजे तसे न केल्यास ती नरकस्थिती ठरेल)
तथा चोक्तं पूर्वाचार्य्यमुनिभि: । सुवर्णमेकं गामेकां भुमेरप्येकमंगुलं । हरन्नरकमाप्नोति या(वदाभूत) संप्लवं ॥६॥
अर्थ : एखादे सोन्याचे नाणे, एक गाय, पृथ्वीवरील भूमीचे दान केले असता ते जो परत हरण करतो किंवा ते घेण्याची इच्छा करतो त्याला निरंतर नरक प्राप्त होतो असे मुनी आचार्यांनी सांगून ठेवले आहे.
मंगलं महाश्री । (शुभं भ) वतु ॥ ले(ख)कपाठयोः ॥
अर्थ : श्रेष्ठांचे (वडीलधा-यांचे) कल्याण असो, सर्व शुभ होवो, लेखक व वाचक यांचे ही शुभ होवो.
याच्या वाचनांती काही गोष्टी ठळकपणे निदर्शनास येतात
१. हा शिलालेख म्हणजे राजाज्ञा होती.
२. राजा केशीदेव याने ब्राम्हणांना भूदान केल्याचा उल्लेख आहे.
३. शक संवत ११६१ विकारी संवत्सर माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री मंगळवार या दिवशी दानपत्र दिले.
४. या आज्ञेचा अथवा नियमांचा भंग करणाऱ्यांसाठी नरकप्राप्ती शापवाणीचा धाक घालण्यात आला आहे.
५. ब्रम्हपूरी, बापगाव या गावांचा उल्लेख
६. सूंपेश्वर मंदिर या प्राचीन मंदिराचा उल्लेख
७. राजा केशीदेव याचे वंश व कूळ व पित्याचे नाव
८. राजा केशीदेव याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे
९. सदर शिलालेख संस्कृत भाषेत असून, लिपी नागरी आहे
१०. या शिलालेखात ६ श्लोक व २२ ओळी आहेत
याचा नेमका अर्थ स्थानिक ग्रामस्थांना माहीत नसल्यामुळे या शिळेला स्पर्श झाल्यास गावावर संकट येईल, अशी त्यांना भीती वाटत होती. गावकऱ्यांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. इतिहासकार, जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभाग, पोलिस, लोणाडचे सरपंच, पोलिस आणि स्थानिक नेते यांनी संयुंक्तपणे अनेक वर्षे काम करून जनजागृती घडवून आणली. आणि २०१४ रोजी महाशिवरात्रीला सुमेश्वर/सुम्पेश्वर मंदिराजवळ शिलालेखाची साग्रसंगीत पूजा करून लोकांना दिसेलअसा लोखंडी जाळीआड सुरक्षित स्थापना केली.
सुमेश्वर मंदिरातील शिवलिंग व शिवपार्वतीची मूर्ती पाहण्यासारखी आहे

जवळच लोणादित्य मंदिर (लोणाड) व खांडेश्वरी माता मंदिर (जानवळे) भेट देता येईल
कसे जाल? : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून पडघे गावासाठी निघून सावद नाक्यावर उतरावे. येथून डावीकडे लोणाडला जाणारा फाटा आहे. जानवळे गावाच्या कमानीतून सरळ आत गेल्यावर १.५ ते २ किमी वर चौधरपाडा गाव आहे
स्वतःचे वाहन असेल तर प्रवास सुलभ होईल
संकलक
आयशा आस्मा
९६१९९७१४९५
https://aaishaasma.wordpress.com/









.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)












































No comments:
Post a Comment