जुन्नर -घाटघर परिसर म्हणाले कि जीवधन-नाणेघाट हे सर्वपरिचित समीकरण.पण याच परिसरात आणखी एक प्राचीन घाटवात लपली आहे 'भोरांड्याचे दार'. अस्सल भटके आणि काही गावकरी सोडले तर फार कोणी या घाटवाटेच्या नादाला लागत नाहीत्,याच भोरांड्याचा दाराचा आज परिचय करुन घेउया. मुरबाड तालुक्यातील भोरांडे गाव परिसरातून जर जुन्नरला येणं झालं तर याच वाटेचा वापर करतो म्हणून या घाटवाटेला भोरांड्याची नाळ असं देण्यात आले असावे. खरेतर ऐतिहासिक नाणेघाटला पर्यायी व्यवस्था रस्ता म्हणून कदाचित या भोरांड्याच्या नाळेचा पुर्वजांनी वापर केला गेला असावा असे येथील असलेल्या कोरीव पाण्याच्या टाकी वरुन लक्षात येत होते.ही टाकी आपणास घाटवाटेच्या मधोमध असलेल्या वृक्षापाशी पहावयास मिळतात.
भोरांड्याच्या दाराच्या माळशेज घाटातून दिसणारे दृष्य
भोरांड्याचे दार, नाणेघाट परिसराचा नकाशा
भोरांड्याचे दार:
- घाटमाथ्यावरचे गाव: अंजनावळे/ घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
- जवळचा दुर्ग: जीवधन
- कोकणातले गाव: भोरांडे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे
- स्थानवैशिष्ट्य: नाणेघाटाच्या ईशान्येस. पुरातन घाटवाट
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: माथ्याजवळ पाण्याचे दुतोंडी टाके, नाळेमध्ये पाण्याची दोन टाकी
- वाटेत पाणी: घाटाच्या नाळेमधल्या टाक्यांचे पाणी वर्षभर असते, पण नियमित उपसा नाही. टाळलेले बरे.
- निवारा: नाणेघाटाच्या गुहेत, किंवा परिसरातल्या हॉटेल्सजवळ
- उतराई: ५५० मी
- वेळ: २.५ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:
घाटघरच्या माळावर नाणेघाटाच्या उत्तरेला अजून एक अंगठ्यासारखी डाईक आहे.याच्या शेजारून भोरांड्याच्या दाराची वाट उतरते.
- घाटमाथ्यावरचे गाव: अंजनावळे/ घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
- जवळचा दुर्ग: जीवधन
- कोकणातले गाव: भोरांडे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे
- स्थानवैशिष्ट्य: नाणेघाटाच्या ईशान्येस. पुरातन घाटवाट
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: माथ्याजवळ पाण्याचे दुतोंडी टाके, नाळेमध्ये पाण्याची दोन टाकी
- वाटेत पाणी: घाटाच्या नाळेमधल्या टाक्यांचे पाणी वर्षभर असते, पण नियमित उपसा नाही. टाळलेले बरे.
- निवारा: नाणेघाटाच्या गुहेत, किंवा परिसरातल्या हॉटेल्सजवळ
- उतराई: ५५० मी
- वेळ: २.५ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:
घाटघरच्या माळावर नाणेघाटाच्या उत्तरेला अजून एक अंगठ्यासारखी डाईक आहे.याच्या शेजारून भोरांड्याच्या दाराची वाट उतरते.
नाळेच्या तोंडाशी तालिश रेस्टॉरंट आहे.
घाटघरच्या पठारावरुन मंद चढावरून सह्यधारेकडे चालत निघालो कि समोर अंजनावळे गावच्या वऱ्हाडी डोंगराची टोके आभाळात घुसलेली दिसतात.
भोरांड्याच्या दाराची उतराई सुरु व्हायच्या आधी, घाटाच्या माथ्याअलिकडे पाण्याची खोदलेली टाकी आहेत, एका बंधाऱ्याजवळ उतरंड्या कातळावर टाकी आहेत.
कातळात खोदलेली तीन टाकी समोर होती. डावीकडे होतं थोडीशी खोदाई करून सुरुवातीलाच सोडून दिलेलं टाकं, तर उजवीकडे एक दुतोंडी टाकं.
दुतोंडी टाकं कातळाच्या आत खोदत नेलेले. पाणी नसलं, तर ओलसर चिखल साचलेला.
कातळखोदीव टाक्यांपासून हाकेच्या अंतरावर सह्यधारेजवळ भोरांड्याच्या दाराची वाट सुरुवात होते.
झुडुपांमधून-धोंड्यांमधून ५० मी उतरल्यावर झालेलं भोरांडयाच्या दाराचं दर्शन होते
पावसाळ्यात शिळंधार बरसणाऱ्या पावसाच्या पाण्याने पश्चिमेला कणखर सह्याद्रीमधून अशी घळीची वाट कोरून काढली आहे. मोठ्या पडलेल्या दगडाच्या पश्र्चिमेकडुन ही वाट खाली उतरत जाते.पावसाळ्यात वरुन येणार वाहते पाणी खाली ओढ्याच्या रूपात सामिल होत व खळखळ आवाज करू लागते. हा ओढा आपल्या उतरणीला उजव्या बाजूला ठेवून खाली उतरत राहावे.
जोपर्यंत दुसरा कातळ टप्पा येत नाही तोपर्यंत आपण पाऊलवाटेने उतरत रहावे. दुसरा कातळ टप्पा आला की आपल्या उजव्या बाजूला असलेला ओढा आपणास येथे क्रॉस करावा लागतो व उजवा असलेला ओढा आता आपल्या डाव्या बाजूला सोबती बनून चालू लागतो. पुढे ही पाऊलवाट पुन्हा थोडी फिरून पुन्हा डाव्या बाजूला असलेल्या ओढ्यात घेऊन येते.
अगणित धोंड्या-खडकांतून कातळभितींच्या साथीने उतराई सुरु असते.
नाळेतले धोंडे संपत आले. थोरल्या झाडापाशी आलो. उजवीकडच्या कातळभिंतीत ७० फूट उंचावर टाकी होती. अर्थात, माहिती नसेल आणि मुद्दाम लक्ष नाही ठेवलं, तर घाटाच्या वाहत्या वाटेवरून त्या तिथे कातळभिंतीत पाण्याची टाकी असतील, हे कळणं तसं अवघडंच!
अलिकडच्या दरडीवरून वळसा घालून दरड चढून टाक्यांपाशी पोहोचतो. हेही दुतोंडी टाकं. कदाचित उपसा नसल्याने, उन्हाळ्यातही पाणी गच्च भरलेलं. थंडगार!
टाक्यांपासून उतरून परत मुख्य घाटवाटेवर आल्यावर, पदरातल्या रानाचा सुरेख टप्पा सुरु झाला. उंचच उंच वृक्ष!
घाटातून उतरणारा ओढा समोर - वायव्येला जातो, मात्र घाटवाट ओढ्याची साथ सोडून उत्तरेला भोरांडे गावाच्या दिशेने निघते. झाडीच्या टप्प्यातून बाहेर आल्यावर मागे बघितलं, तर भोरांड्याच्या दाराची घळ लक्षवेधक दिसते.
किंचित चढावरून वाटेनं लपेटदार वळण घेतलं, आणि समोर उत्तरेला सामोरं सह्याद्रीचं भव्य दृश्य! कुलंग-मदन-अलंग-आजोबा-कात्राबाई आणि पायथ्याच्या कोकणातल्या वाड्या वस्त्या चढउतार... विलक्षण सुरेख दृश्य!
घाटाची उरलेली उतराई म्हणजे पदरातून लांबच लांब आडवी वाट, अलगत उतरणारी वळणां-वळणांची. एव्हाना समोर वायव्येला न्हाप्ता-हरिश्चन्द्रगडाचा कोकणकडा-तारामती-हरिश्चन्द्र शिखरे खुणावू लागली.
पुढं पुन्हा आधी लागलेला ओढा ओलांडून डाव्या बाजूची वाट घ्यावी. याच ठिकाणाला भोरांडे धबधबा म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. खडकावर सत्तर ऐंशी फुट फेसाळणा-या व कोसळणाऱ्या दृष्याला भोरांडे धबधबा नाव दिले आहे.
भैरवगडाचं भेदक पण देखणं रूप.
पुढील वाटचालीत मात्र ओढा उजव्या बाजूला थोडा लांबवर राहणार होता. पुढे चालत गेल्यावर मोठं मोठाले आंब्याचे वृक्ष दिसतात. पुढे दोन्ही बाजूला ओढे लागले होते. अचानकच समुद्राच्या बेटावर आल्याचा भास तोता. दोन्ही ओढ्यांच्या वाहणाऱ्या पाण्याचा खळखळ आवाज मात्र आपल्या चालण्याला साथ देतो. पुढे पुन्हा ओढा ओलांडून आपले नगर कल्याण हायवेवर येतो. येथून कड्यात वसलेल्या भोरांडेच्या नाळेचे सुंदर रूप पहावयास मिळते. येथे ओढ्याच पात्र रूंद झाल्याने त्याचे जणु मोठ्या नदीत रूपांतर झाल्याचा भास होतो. येथे हजारो पर्यटक या ओढ्याच्या पाण्यात आनंद घेताना दिसतात.
येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून येथे भोरांडे ग्रामस्थांना छोटाले हाॅटेल उभारून आर्थिक गरज भागविता येत आहे.येथे चहा पाणी घेत नगर कल्याण हायवेनेच तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणेघाट पाॅईंटवर पोहचता येते.
अशी हि भोरांड्याच्या दाराची वाट सुरेख मळलेली, अजिबात न दमवणारी.
८२९०००८३७०













No comments:
Post a Comment