यापूर्वी- आधी निर्माण केलेल्या लेणी उभारणीचा अनुभव ध्यानी घेऊन खोदाईचे तंत्र कालांतराने विकसित झाल्याचे दिसते. या लेण्यांमध्ये दुर्मीळ असलेल्या इमारतीप्रमाणे मजल्याचे काम हाती घेण्यात आले हे विशेष. त्यासाठी जिने, गच्ची, सज्जे अशा प्रकारचेही पूरक बांधकाम करण्यात आले आहे. अजिंठा लेण्यांचे काम पूर्ण झाल्यावर इ.स. ५व्या शतकात ही अजरामर शिल्पकला निर्माण झाली.
मालोजीराजे भोसले समाधी वेरूळ
संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात ह्या हिंदूस्थानाच्या इतिहासाला कलाटणी देणार्या दोन पुरूषांची समाधी आहे. संभाजीनगर परिसरात आल्यावर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वराकडे मंदीराकडे जाताना दगडात कारलेले इतके सुंदर नक्षीकाम कोणत्या देवालयाचे असेल? हा प्रश्न तुम्हाला सतावल्यावाचून राहणार नाही. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात मालोजीराजे भोसले चिरविश्रांती घेताहेत साक्षात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांचे पिताश्री आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मराठेशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाच्या व्यक्ती ज्या राजे भोसले घराण्याने शतकानुशतके गुलामगिरीच्या अंधकारमय राजवटीत होरपळून निघालेल्या रयतेला स्वातंत्र्याचा ,स्वराज्याचा राष्ट्रप्रेमाचा धर्मनिष्ठेचा महामंत्र दिला त्या भोसले घराण्याचे संस्थापक एक कर्तबगार व्यक्ती घृष्णेश्वर मंदीराचा जिर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनीच केला होता.तसेच शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या परिसरातील पुष्करणी तलाव आताचे शिवतीर्थ हे मालोजीराजे यांनीच बांधले आहे.
हे आपल्याकडेच असं का होतं?एका इतिहासातील खलनायकाला देवालयात स्थान मिळतं, तिनशे वर्षांनंतरही त्याच्या स्मृतीस्थळाची नित्य देखभाल केली जाते, त्यावर दिवाबत्ती लावली जाते,अनं दुसर्याच्या वाट्याला येते प्रचंड हेटाळणी.मालोजीराजे भोसले आणि औरंगजेब...भारताच्या इतिहासातली अत्यंत महत्वाची पाने यांच्या पराक्रमाने भरली आहेत...दोघांच्या भूमिका हिन्दूस्थानच्या दृष्टीने तशा परस्परविरोधी.मालोजी राजांनी अचाट बाहुबलाच्या जोरावर मैदानात मराठी पराक्रमाचा झेंडा रोवला...हिंदवी स्वराजाचे स्वप्न रंगविणार्या शहाजी या पराक्रमी पुत्राला जन्म दिला, तर औरंगजेबने आपल्या अत्यंत धुर्तपणाने राजकारण करून अवघ्या भारतवर्षावर निरंकुश सत्ता प्रस्थापित केली.त्यावेळची जगातली ही एक बलशाली राजवट होती.. एक अशी व्यक्ती ती म्हणजे औरंगजेब त्याची हि कबर वेरूळ जवळ खुलताबादेत आहे हा तोच औरंगजेब ज्याला मराठ्यांना हरविण्यासाठी लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रात यावे लागले तब्बल 25 वर्षे त्याला मराठ्यांना हरविण्यासाठी दिल्ली सोडून महाराष्ट्रात भटकावे लागले पण त्याला मराठ्यांना हरविता आले नाही शेवटी त्याला मरावं लागले ह्या महाराष्ट्रात भिंगार मध्ये आणि त्याची कबर खोदली संभाजीनगरच्या खुलताबादेत .ती पण मराठ्यांनीच त्यांची साक्ष आजही त्याची कबर देतेय. हा योगायोग म्हणावा लागेल कि ज्या हिंदूस्थानाला परकीय सत्तांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्याचा महामंत्र देणार्या म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांच्या पित्याची हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची मालोजीराजे भोसले यांची समाधी. वेरूळात घृष्णेश्वर मंदीराच्या परीसरात चिरविश्रांती घेताहेतपरंतू या दोघांच्या स्मृतीस्थळांना परस्परविरोधी भाग्य लाभल्याचे दिसून येते!ह्या दोन व्यक्ती दोन्हींचे विचार भिन्न कार्य कर्तृत्व भिन्न काळभिन्न औरंगजेबाच्या जन्माच्या पुर्वी अगदी थोड्या काळापुर्वी मालोजीराजे यांचे निधन झाले होते औरंगजेबाचा जन्म 1618 ला झाला पुढे त्यांच्या एकूण कर्तृत्वाने काय पाहिजे आणि त्यानंतर त्यांच्या बलाढ्य मुघल सत्तेचे काय झाले हि एक विचार करायला लावणारी गोष्ट. मालोजीराजे यांच्या कर्तृत्वाने नेतृत्वाने काय दिले.ह्या दोन व्यक्ती एकाच भूमीत चिरविश्रांती घेताहेत अंतर फक्त पाच किलोमीटरच आहे
मालोजीराजांचा इतिहास विचारात घेतल्यास, मालोजीराजांचा जन्म १५५२ सालचा.विजापूर सुल्तानाविरुद्धच्या युद्धात इंदापूर येथे ते कामी आले.साल अंदाजे १६२० असावे. फलटणचे जहागिरदार ज्यांना बारा वजीराचा काळ असेही म्हणत त्यांचा पातशाही दरबारात विशेष दबदबा होता ते वणंगपाळ उर्फ जगपाळराव यांच्या मालोजीराजे आणि विठोजीराजे त्यांच्या सहवासात असताना मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी जगपालराव यांच्या कोल्हापूर मोहिमेत विशेष पराक्रम गाजवला .त्यांची किर्ती सर्वत्र झाली. मालोजीराजे यांचे शौर्य कर्तृत्व पाहून जगपाळराव नाईक यांनी आपल्या बहिण दिपाबाई ह्या मालोजीराजे यांना पत्नी म्हणून दिल्या होत्या. ह्या जगपाळराव आणि मालोजीराजे यांच्या मध्ये खूप स्नेह होता वेळोवेळी त्यांनी एकमेकांना मदत केली.मालोजीराजे यांच्या पराक्रमाने त्यांच्या अहमदनगरच्या निजामशाही दरबारात प्रवेश झाला आणि तिथे त्यांच्या विशेष सन्मान हि झाला त्यांना १६०४ साली अहमदनगरच्या निजामशाहीकडून जहागिरी मिळाली.आणि राजा हा किताब हि मिळाला होता. मालोजीराजे यांना स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि शरिफजीराजे हि दोन मुले होती. मालोजीराजे हे इंदापूर येथे आदिलशाही विरुद्धच्या लढाईत धारातीर्थी पडले.ह्याच मालोजीराजे भोसले यांच्या पुत्रानं परकीय शत्रूत राहून हि आपल्या पराक्रमाच्या जोरावर परकीय शत्रूतही आपला दरारा ठेवला आणि एका सार्वभौम राजाप्रमाणे कर्नाटकात बंगलोर राजधानी बनवून राज्य केले आणि त्यांच्या नातवाने म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी तर हि अख्खी पातशाही पायदळी तुडवून रयतेचे आपले स्वराज्य निर्माण केले. आपल्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याच्या भगवा ह्या हिंदूस्थानाच्या मातीत फडकवला आणि रयतेच्या गवताच्या काठीला हि कोणाची हात लावण्याची हिम्मत होत नव्हती असे सुशासन निर्माण केले आजही रयतेच्या मनात आपल्या महाराजांच्या बद्दल प्रचंड अभिमान आहे आणि आदर आहे. अश्या विश्ववंदनीय थोर महामानवांचे आजोबा मालोजीराजे भोसले.
औरंगजेबाच्या तैमुर खानदानानं काय केलं निष्पाप रयतेवर अन्याय अत्याचार सत्ता संपत्ती साठी त्यांनी मानवतेच्या सर्व मर्यादा पार केल्या .आणि औरंगजेब याने त्यांच्या सत्तेसाठी काय केले कोणतीच मानवतेची मर्यादा पाळली नाही शेवटी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुघल सत्तेचे काय झाले? सत्ता संपत्तीचा आणि ताकदीचा मोह नसावा हेच माणसाला र्हासास कारणीभूत ठरतात हेच औरंगजेबाचा तैमुर वंशाचा इतिहास सरकारकडे एकच विनंती आहे की ह्या शिवभक्त शुभम गायकवाड ची कि आपल्या विश्ववंदनीय हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमी गौरवशाली वैभवशाली लोकहितवादी सांगणार्या आणि जपणार्या छत्रपती घराण्याच्या आद्य पितामहाचे मराठेशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या समाधीचा जिर्णोद्धार व्हायला पाहिजे त्याठिकाणी भव्य ऐतिहासिक समाधी स्मारक व्हायला पाहिजे हि एक शिवभक्त म्हणून सदिच्छा !
वास्तविक हे ठिकाण काही आडबाजूला नाही.भरपूर राबता असलेल्या एका ज्योतिर्लिंगाचे रस्त्यावर अवघ्या दोनशे फुटांवर आहे. समाधीच्या दुरावस्थेबाबत पेपरमध्ये बातमी सुद्धा आली होती तरी सरकारचे डोळे उघडत नाहीत.
समाधीच्या चारही बाजूला दहा फूट दगडी फरसबंदी करून आणि त्यानंतर दहा फूट फुलझाडे व कंपौंड केल्यास व एक रखवालदार ठेवावा. सकाळी सात ते रात्री सात पर्यंत दर्शनासाठी उघडी ठेवावी म्हणजे मंदिरात येणारे भाविकही राजांच्या समाधीचे दर्शन घेऊ शकतील. घृष्णेश्वर देवस्थानने याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून जवळच असलेल्या मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे प्रवेशद्वार , पुतळे व अन्य सुविधा केल्याचे दिसते आहे. परंतु तेथेही झाडेझुडपे वाढली आहेत. तेही पर्यटक पहातील अशी आशा नक्कीच करुया. कधी वेरूळला गेलात तर घृष्णेश्वरांच्या चरणी नतमस्तक व्हा तसेच जवळच मालोजीराजे हे चिरविश्रांती घेताहेत त्यांच्या हि चरणी नतमस्तक व्हायला विसरू नका. जय मालोजीराजे !
वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर टपर्यांनी वेढा घातलेली एक अतिशय जूनी दगडी समाशी आहे. ही समाधी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची असल्याचे सांगितले जाते. या शिवाय मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी संरक्षक भिंतीला लागून एक कबर आहे. कबरीच्या चार दरवाज्यांना लागून आठ कोरीव कातीव दगडी खांब आहेत. आतूनही ही कबर अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पण इथे कुणाला पुरलेलं दिसत नाही. ती जागा रिकामी आहे. या कबरीला जायला जागाच नाही. गच्च रानगवताने झाडा झुडूपांनी वेढलेला आहे हा परिसर. याला लागूनच पुढे शांतिगिरी महाराजांच्या आश्रम परिसरांत अजून एक छत्री आहे.
या तिनही वास्तु अतिशय उपेक्षीत अशा आहेत. मालोजी राज्यांची समाधीचा दरवाजा पुरातत्व विभागाच्या रक्षकाने कुलूप लावून बंद केल्याने आत स्वच्छता राखलेली आढळून येते. बाकी सर्व परिसरांत घाण केलेली दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळून येत आहेत.
मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूलाच मालोजी राजांची गढी आणि भव्य असा पुतळा नव्याने उभा केला गेला आहे. मग ही जूनी समाधी का अशी उपेक्षीत ठेवल्या गेली? ही समाधी मालोजी राजांची नसून त्यांचे वडिल बाबाजी भोसले यांची असल्याचे पण सांगितले जाते. या बाबत नेमकी माहिती उपलब्ध होत नाही.
मंदिरावर असलेले अप्रतिम असे कोरीवकाम, जून्या लाकडी वाड्यासारखी दगडावर कोरलेली नक्षी, सागवानी दरवाजे जसे असतात तसे तीन दगडी दरवाजे समाधीच्या तिन बाजूला आहेत. ते इतके हुबेहुब लाकडाचे वाटतात की आपण लाकूड समजून त्यांना ढकलू पाहतो. खिडक्यांच्या कमानी नक्षीच्या जून्या मंदिराच्या कमानींसारख्या वळणा वळणाच्या नक्षीने कोरलेल्या आहेत.
लाकडी माळवदाला आधार देणारे खांब किंवा जून्या मंदिरावर यक्ष कोरले असतात तसे सुंदर अशी दगडी रचना समाधीच्या प्रदक्षिणा पथाला खालच्या बाजूने करण्यात आली आहे. समाधीच्या मुख्य घुमटाच्या भोवताली चारही बाजूने दोन दोन आणि कोपर्यावर एक असे एकूण बारा सुंदर छोटे मिनार आहेत.
हे सगळे बांधकाम निजामशाहीच्या काळातील आढळून येते. ही समाधी मालोजी राजांची असण्याची खात्री पटते कारण लखुजी जाधव यांची समाधी याच पद्धतीची सिंदखेड राजा येथे आहे. त्याच्या आधीचा कालखंड मालोजी राजांचा आहे. मालाजी राजांचा मृत्यू इंदपूरला झाल्याचे सांगण्यात येते. त्यावरून काही संशोधक ही समाधी मालोजी यांची नाही असे प्रतिपादन करतात. पण खुद्द लखोजी जाधव यांचाही मृत्यू देवगिरी किल्ल्यात झाला होता. त्यांची समाधी पण त्यांच्या मुळ गावी सिंदखेड राजा येथेच आहे. मालोजी राजांची गढी मंदिराच्या जवळच असल्याने ही समाधी त्यांचीच असण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय शंभू महादेव हे भोसल्यांच कुलदैवत. तेंव्हा मंदिरा समोर समाधी असण्यासही एक संयुक्त कारण आहे. बाजूची रिकामी कबर कुणा सरदाराची असावी. पण त्याचे निधन दुसरीकडे झाले आणि मृतदेह तिथपर्यंत आणता आला नसल्याने ही जागा रिक्त राहिली. अशा पण काही कबरी याच परिसरांत आहेत.
तिसरी जी समाधी आहे ती कुणाची आहे याची माहिती नाही. पायर्या नसल्याने गर्भगृहात जावून पहाता येत नाही. तिथे वटवाघुळांचा मुक्त संचार आहे. कसरत करत वर चढल्यावर गाभार्यात वटवाघूळांच्या विष्टेची प्रचंड घाण साठलेली दिसून येते. घाणीचा भपकारा इतका आहे की नाक झाकून घ्यावे लागते. ही समाधी आतून पूर्ण शाबूत आहे. बाहेरून बराचसा भाग ढासळला आहे. शिल्लक अवशेषांवरून मुळ समाधीची भव्यता आणि मुख्य म्हणजे नक्षीकामाचा दर्जा याची कल्पना येते.
सुवर्णसिंहासनाचे पाय असतात तसे देखणे समाधीच्या चार कोपर्यात चार पाय कोरलेले आहेत. जे आजही संपूर्ण शाबूत आहेत. या समाधीला तळघर आहे. जे सध्या दगड लावून बूजून टाकलेले दिसते आहे. पश्चिमेच्या खिडकीला सुंदर नक्षीकाम केले असून राजस्थानी पद्धतीने समोर छज्जा काढला आहे.
कबर, समाधी आणि छत्री असे तीनही प्रकार इथे आढळून येतात. इतिहास संशोधकांनी यावर अजून प्रकाश टाकायला हवा. मुळात घृष्णेश्वर परिसरांतील सर्व अतिक्रमणे हटवून तिथे स्वच्छता केली गेली पाहिजे. या जून्या वास्तूंभोवती संरक्षक भिंती उभारल्या गेल्या पाहिजेत. नुकतीच मलिक अंबर कबर आणि परिसराची ज्या प्रमाणे डागडुजी केली आहे तशी इथे करण्याची नितांत आवश्यकता आहे.
मुळात आपल्याला जून्या वास्तुंबाबत अनास्था का आहे? नविन तर आपण तसं बांधूच शकत नाही तर किमान जतन तर केलं पाहिजे. हा संपन्न असा वारसा आहे. पाश्चिमात्य पर्यटक आपल्या देशांत केवळ आपल्या संपन्न इतिहासाचा वारश्याचा अभ्यास करायला येतात. त्यांची अपेक्ष किमान स्वच्छता असावी ही पुरातन स्थळं सुरक्षीत असावीत इतकीच आहे. ती पण आपण पूर्ण करत नसूत तर कुणावर आणि किती टिका करायची?
मालोजी राजे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. त्यांच्या नावाने नविन गढी उभारण्याची पुतळा उभा करण्याची आपल्याला मोठी हौस. पण त्यांचीच समाधी मात्र घाणीत सापडलेली. हा नेमका काय विरोधाभास?
समाधी कोणाची यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. पण या समाधीची भव्यता, कारागिरी आणि तिचे स्थान भोसले घराण्यातीलच कुणा व्यक्तीची असल्याची ग्वाही देतात हे निश्चित.
(फोटो सौजन्य : आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किनली)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575शहाजी महाराजांची कार्कीर्द :-
वेरुळ लेण्यांचा नकाशा
वेरुळ लेण्यांचा माहिती फलक
वेरुळ लेण्यांचा प्रत्यक्ष परिसर
वेरुळ लेणी, काही कुट प्रश्न :-
युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं. या मंदिराची निर्मिती ही 'आधी कळस मग पाया', या तत्त्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर, नाही तर डोंगरफोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत. मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे. कैलास लेणं हे मंदिर बनवण्यासाठी साधारण 150 वर्षं लागली असावी असं संशोधकांना वाटतं. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे, असं हिंदू पुराणांमध्ये म्हटलंय. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात.
इतिहास संशोधक डॉ. दुलारी कुरेशी सांगतात, "कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास 20 हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे.
या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे, सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूस भगवान शिवाचं तांडव नृत्य करणारं शिल्प कोरण्यात आलं आहे.
तसंच मंदिराच्या शिखरावर पाच सिंह कोरण्यात आले आहेत. आपण महाबलीपुरम येथे पाहिलं तर तिथेही सिंह, हत्ती कोरलेले आहेत. मात्र इथे कैलास मंदिरात या हे प्राणी पूर्णाकृती रूपात पाहायला मिळतात. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याळ आणि हत्ती यांसाख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेलं आहे.
हे मंदिर म्हणजे दक्षिण आणि उत्तर वास्तु स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. इथे समोरच्या बाजूला पाहीलं तर तुम्हाला गोपुरं दिसतात, तर पाठीमागच्या बाजूला शिखर दिसतात. तसंच या मंदिराच्या समोरील दोन्ही बाजूस दोन हत्ती आणि दोन ध्वजस्तंभ कोरलेले आहेत."
20 हजार टन दगडांचं काय केलं?
डोंगर फोडून जेव्हा कैलास मंदिर बनवण्यात आलं, तेव्हा जवळपास 20 हजार टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला. पण कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचे अंश दिसत नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या खडकांचं नेमकं काय झालं, याबद्दल माहिती देताना डॉ. कुरेशी सांगतात की, "आपण पाहिलं तर कैलास मंदिराच्या जवळपास अनेक मंदिरं आहेत. तसंच मराठवाड्यातही अनेक मंदिरं आहेत, जी चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात बांधण्यात आलेली आहेत. या मंदिरांचे बांधकाम कैलास मंदिर ज्या खडकामध्ये आहे त्याच खडकांत आहेत.
मात्र त्या मंदिरांच्या जवळपास कुठेही उत्खनन केलेलं नाही अथवा डोंगरही नाहीत. त्यामुळे कैलास मंदिराच्या निर्मितीमधून निघालेला खडक या मंदिराच्या निर्माणात वापरला असावा अशी शक्यता आहे. मात्र हे ठाम पणे सांगता येत नाही.
कैलास मंदिराखाली एक पुरातन शहर आहे का?

औरंगजेबाने कैलास मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला का?
औरंगजेब आणि कैलास मंदिर यांच्याबद्दल एक संदर्भ दिला जातो, तो म्हणजे, औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरं नष्ट केली. मात्र तो जेव्हा कैलास मंदिर नष्ट करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या 1000 सैनिकांनी 3 वर्षांपर्यंत मंदिर तोडण्याचे प्रयत्न केले मात्र तो या कामात यशस्वी होऊ शकला नाहीत.
वेरुळ लेणी आणि चित्रकला :-
विहारांमधे कोरलेली जातककथा तसेच बुद्धाच्या जीवनप्रसंगांचा उल्लेख असणारी रंगेबिरंगी चित्रे हे अजिंठा लेणीचे प्रमुख वैशिष्ट्य. अजिंठा लेणीतील चित्रांची शैली जगप्रसिद्ध होऊन 'अजिंठा शैली (अजिंठा स्कूल ऑफ आर्ट्स)' ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. ह्याच शैलीत काळानुरुप थोडाफार बदल होऊन अशी चित्रे वेरुळ लेणीत रंगवली गेली. ह्या शैलीला 'उत्तर अजिंठा चित्रशैली (पोस्ट अजिंठा स्कूल ऑफ आर्ट्स)' असे ओळखले गेले. ही चित्रे कैलास एकाश्ममंदिराच्या सभामंडपातील छतावर आणि नंदीमंडपातील छत आणि भिंतींवर दिसतात. याखेरीज एलापुरातील जैन लेणीतील क्र. ३२ व ३३ - इंद्रसभा व जनन्नाथसभा ह्या दोन लेण्यांतही फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. कैलासातील चित्रांमध्ये काही पौराणिक प्रसंग, तसेच नक्षीचे रंगकाम केलेले दिसते तर जैन लेण्यांतील चित्रांमध्ये गोमटेश्वर, पार्श्वनाथ, महावीर यांची चित्रे, काही नृत्यप्रसंग, वाद्यप्रसंग, यक्ष-यक्षिणी तसेच फुलाफुलांची, चौकटीची असे नक्षीकाम चित्रांकित केलेले आढळते.
वेरूळमधील शेवटच्या जैन लेणीच्या निर्मितीपर्यंत म्हणजे साधारण ११ व्या शतकापर्यंत ह्या चित्रांची निर्मिती होत राहिली. राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर ह्या अजिंठा शैलीचा उत्तर अजिंठा चित्रशैलीच्या रूपाने असलेला उरलसुरला दुवाही निखळून गेला व चित्रशैली संपूर्णपणे लयास गेली.
उत्तर
अजिंठा चित्रशैलीतील ह्या वेरूळलेण्यांतील डॉक्युमेन्टेशनचा शोध घेण्याचा
मी बराच प्रयत्न केला पण त्याचे कुठलेही संदर्भ मला मिळाले नाहीत. त्यामुळे
ह्या लेण्यांतील बहुतांश चित्रे नेमक्या कुठल्या प्रसंगांची आहेत हे
सांगता येत नाही. पर्यायाने त्यांचे वर्णनही मला येथे देता येणार नाही.
त्यामुळे आता पुढे फक्त येथील चित्रांची मोजकी छायाचित्रे देतो.उत्तर-अजिंठा चित्रशैली, ही मूळ अजिंठा शैलीचा र्हास होतानाच्या काळातली असावी, असे या चित्रांवरून वाटले. अर्थात सरसकटपणे असे म्हणणे योग्य ठरणार नाही, कारण प्रत्येक कलावंताचे कसब व समज हे कमी-जास्त असणारच, शिवाय हजारेक वर्षांनंतर उरल्या-सुरल्या चित्रांवरून काही मत प्रदर्शित करणेही फारसे योग्य नव्हे.
पूर्वी कला, कसब, कारागिरी वगैरे एका पिढीपासून पुढल्या पिढीत लहानपणापासून संक्रमित होत असल्याने आता आपल्याला कठीण वाटणारे काम सहजपणे केले जात असावे. (आताचा प्रत्येक कलावंत हा पुरेसा मोठा झाल्यावर आपापल्या कष्टाने सुरुवातीपासून कला शिकत असतो) तसेच एकाच चित्रात दोन-तीन चित्रकार काम करायचे, हे अजूनही राजस्थान वगैरेतील पारंपारिक चित्रात बघायला मिळते. म्हणजे एक जण आधी मानवाकृती काढणार, दुसरा फक्त डोळे रंगवणार, तिसरा झाडे, चवथा इमारती, पाचवा सोन्याचे काम करणार, वगैरे. असे पाश्चात्य कलेतही होते, गंमत म्हणजे हल्लीचे आघाडीचे म्हणवले जाणारे कलावंत (उदा. मनजीत बावा, गुजराल इ.) तर या सर्वांवर कडी करून दुसर्यांकडून संपूर्ण चित्र, मूर्ती इ. बनवून घेऊन स्वतः धंद्याची आघाडी संभाळत असतात.
हि गुंफा चित्र बघताना काही प्रश्न मनात येतात. अंधारात चित्रे कशी रंगवली असतील ? या बद्दल दोन-तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रश्न नुस्ती चित्रे काढण्यापुरता नसून ती नंतर अनेक-- कदाचित शेकडो -- वर्षे बघितली पण गेली असणार.
एक तर आजचा पर्यटक अल्प काळासाठी बाहेरील उजेडातून आत जातो, त्यामुळे जसे आपल्याला सिनेमा गृहात शिरल्यावर पहिली काही मिनिटे काहीच दिसत नाही, तसे होत असते, कारण डोळ्यांचे छिद्र ( aparture ) बाहेर असताना अगदी लहान असते, ते हळूहळू मोठे होते.गुहांमधे दीर्घ काळ बसून राहिल्यास हळू हळू चित्रे स्पष्ट दिसू लागतात याचा आपण अनुभव घेउ शकतो.
दुसरे म्हणजे आजचा धूळ-प्रदूषणयुक्त शहरात, लहान लहान घरात राहणारा (हल्ली आपल्याला खूप दूरवर डोळे फोकस करण्याची सवय राहिलेली नाही) टीव्ही, मोबाईल, संगणक, वर्तमानपत्रे वगैरेंचा अतिरेकी वापर करणारा अधू दृष्टीचा माणूस आणि हजार वर्षांपूर्वीच्या, या सर्वांपासून मुक्त - नैसर्गिक वातावरणात राहणारा, नैसर्गिक अन्न खाणारा, दूरवर दृष्टीक्षेप करत राहणारा माणूस, यांच्या दृष्टी-क्षमतेतील फरक.
उदाहरणार्थ आपण संग्रहालयात जुनी चिलखते , शस्त्रास्त्रे वगैरे बघतो, ती आपल्याला आज उचलता सुद्धा येणार नाहीत, ती अंगावर चढवून, मैलोनमैल पायी वा घोड्यावर दौडून पूर्वीचे सैनिक दिवस दिवस युद्ध करायचे. अर्थात तेंव्हाच्या आणि आताच्या मानवाच्या शारीरिक क्षमतेत खूपच बदल घडून आलेले आहेत.
प्रत्येक चित्राचे छायाचित्र घेण्यासाठी येथे जवळपास २ दिवस ठाण मांडून बसावे लागेल. वेरूळला जेव्हा केव्हा याल तेव्हा ह्या उत्तर अजिंठा चित्रशैलीतील चित्रे पाहण्यास अजिबात विसरू नका.
बौद्ध लेणी
क्रमांक 2 :
या प्रवेशमंडपातून आत गेल्यावर बारा खांबांचा चौकोनी मंडप आहे. त्या मंडपाच्या दोन्ही बाजूंस प्रचंड आकाराच्या पाच बुद्धमूर्ती आहेत.
क्रमांक 3 :

मध्यभागी असलेल्या मंडपात बारा खांब असून त्यांवर पूर्ण कलश आणि पत्रपल्लवी कोरलेल्या आहेत. मंडपाच्या बाजूच्या दोन्ही भिंतींत आठ, तर गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंसही दोन खोल्या असून गर्भगृहात बुद्धमूर्ती आहे. द्वारपालांपैकी डाव्या बाजूची मूर्ती अवलोकितेश्वराची आहे.

क्रमांक ४ : हे दुमजली लेणे असून दुसऱ्या मजल्यावर बुद्धाची प्रतिमा आणि दोन लहान खोल्या आहेत. बुद्धमूर्तीच्या डाव्या बाजूस कमलनालधारक अवलोकितेश्वर आहे.
बोधिसत्त्वांच्या शेजारी स्त्री-सेविका आहेत. याशिवाय कमलपुष्प हातात धरलेली तारा आणि कमंडलू धरलेल्या भृकुटीचे शिल्प आहे.
क्रमांक ५ :
हे लेणे सर्वांत प्रचंड (३५·६६ X १७·६७ मी.) आहे. या लेण्याला `महारवाडा' असे नाव प्रचलित असले, तरी `महाविहार' याचा हा अपभ्रंश असावा.
गाभारा, दालन, मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूंच्या पडव्या अशी याची विभागणी करता येते. दहा खांबांच्या दोन रांगांमुळे निरुंद पडव्या निर्माण झाल्या आहेत. दर्शनी भागात चार स्तंभ आहेत, तर पाठीमागे अंतराल असून भिंतीत मध्यभागी बुद्धप्रतिमा असलेले मंदिर आहे. अंतरालाला लागून दोन खोल्या, तर मंडपाच्या लगत एकूण सतरा खोल्या आहेत. सर्वसाधारणपणे या लेण्याची रचना चैत्यगृहाप्रमाणे आहे; परंतु गाभाऱ्याची बाजू अर्धगोलाकृती नाही. लेण्याचे छतसुद्धा सपाट आहे. चैत्यगृहामध्ये आढळतो तसा स्तूप नाही; प्रदक्षिणापथही नाही.
गाभाऱ्यात प्रलंबपादासनात बसलेली बुद्धाची मूर्ती धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहे.
मंदिराबाहेर डाव्या बाजूची अवलोकितेश्वराची मूर्ती कमलनाल आणि अक्षमाला घेतलेली आणि खांद्यावर मृगाजिन ल्यालेली आहे; तर दुसरी मुकुटधारी व अलंकार ल्यालेली आहे.
क्रमांक ६ :
वास्तुविधानाच्या दृष्टीने या लेण्याचे तीन भाग पडतात. यांतील दर्शनी भागाचे स्तंभ शालभंजिकांच्या सुंदर शिल्पांनी अलंकृत केलेले होते, असे त्यांच्या अवशिष्ट स्वरपावरून दिसते.
लेणे क्र. ६ चा नकाशा
मधल्या भागात मंडप, त्यामागे अंतराल आणि त्यामागे बुद्धमंदिर आहे. दोन्ही बाजूंस दोन मोठे मंडप आणि बाजूंना नऊ खोल्या आहेत. मुख्य मंडपाचे छत कोसळल्यानंतर लाकडी छत बसविल्याच्या खुरा येथे दिसून येतात. स्तंभावर घटपल्लव (कलश आणि त्यातून डोकावणारी पाने) कोरलेले असून स्तंभाच्या वरच्या भागावर शार्दूल हस्त (ब्रॅकेट) आहेत.
महामयुरी
अंतरालात द्वारपाल वज्रपाणी व अवलोकितेश्वर यांच्या भव्य मूर्ती आहेत. त्यावर पुष्पहार घेतलेले विद्याधर आहेत. डावीकडील भिंतीवर तारादेवी आणि उजव्या भिंतीवर महामयूरी यांची सुंदर शिल्पे आहेत. मयूरवाहनाखालील बाजूस पोथी वाचत असलेला भिक्षू कोरलेला असून वर अंतराळात विद्याधर दाखविलेले आहेत. येथील गाभाऱ्याची द्वारशाखा अलंकरणामुळे उल्लेखनीय ठरते. यातील गंगा-यमुनेच्या लहान मूर्ती अत्यंत नेटक्या आहेत.
क्रमांक ७ :
हे लेणे शिल्परहित असून अपूर्ण आहे.हे लेणे म्हणजे विहार आहे.याचा आकार ५१ फुट ६ इंच लांब तर ४३ फुट ६ इंच रुंद असा आहे.याच्या छताला आधार देण्यासाठी चार चौकोनी स्तंभ कोरले आहेत. गुंफेमध्ये मागच्या बाजुला पाच आणि बाजुच्या भिंतीत तीन खोल्या आहेत.



क्रमांक ९ : कोरीव दर्शनी भाग, प्रमाणबद्ध खांब, पद्मपाणी आणि तारा या देवतांचा प्रार्थनापट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत.या लेण्याची रचना पुढे खुली ओवरी आणि मागच्या बाजुला स्तंभ असलेला मंडप अशी आहे. लेण्याच्या दर्शनी भागात पाच चैत्यकमानी कोरल्या असून इथे अवलोकीतेश्वराच्या मुर्ती कोरल्या आहेत. इथले महत्वाचे शिल्प म्हणजे तारा आणि बोधिसत्व यांची आहेत. लेणी मंडप तीन भागात विभागला असून मधल्या कक्षात बुध्दाची बसलेली मुर्ती वर चार गंधर्व कोरले आहेत. डाव्या कक्षात पद्मपाणी बुध्द आणि दोन सेविका व दोन गंधर्व यांची शिल्प दिसतात. तर उजव्या कक्षात इंद्र, मंजुश्री आणि वज्रपाणी व दोन सेविकांची शिल्प दिसतात.
क्रमांक १० :
प्रांगणाच्या तिन्ही बाजूंचे स्तंभ घटपल्लवयुक्त असून ते वरचा मजला तोलन धरतात. प्रवेशमंडपाच्या मागच्या भिंतीत असलेल्या दरवाजातून चैत्यगृहात जाता येते. हे चैत्यगृह गजपृष्ठाकृती आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा स्तूप कोरलेला आहे. स्तुपाची उंची ८.२३ मीटर आहे. स्तुपावर असलेला यष्टीभाग आज अस्तित्वात नाही.हा स्तुप अजिंठा येथील लेणी क्र. १९ व २६ या स्तुपांपेक्षा वेगळा आहे. या स्तूपाच्या दर्शनी भागावर बोधिवृक्षाखाली प्रलंबपादासनातील धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील बुद्धमूर्ती (४·८७ मी. उंच) असून त्यांचे हात धर्मचक्रपरिवर्त्न मुद्रेत आहेत. मुर्तीच्या पीठावर आणि सिंहासनाखाली चंद्रशीला दाखवली आहे. बुद्धमूर्तीच्या डोक्यावर कमान असून दोन्ही बाजूंस बोधिसत्त्वाच्या मूर्ती व त्यावर आकाशात विहार करणारी गंधर्व -मिथुने बुद्धावर पुष्पवर्षाव करीत आहेत, छताजवळील पाटिकेवर बुद्ध, बोधिसत्त्वांच्या मूर्ती असून त्यांच्या खाली बुटक्या व स्थूल गणांची रांग कोरलेली आहे. त्यावर नागदेव व नागदेवी यांची शिल्पे आहेत. यांच्या मागून बहिर्गोल फासळ्या निघताना दाखविलेल्या आहेत.
दोन ताल म्हणून ओळखली जाणारी हे लेणे प्रत्यक्षात तीन मजली आहे. लेण्यात वरपर्यंत जाण्यासाठी दगडात घडवलेल्या पायऱ्या आहेत. पहिल्या मजल्यात विशेष दखल घेण्याजोगे शिल्पकाम नाही, मात्र मजल्याच्या मध्यभागी असणार्याल गर्भगृहात चौकोनी आसनावर भगवान बुद्धाची पद्मासनात योगमुद्रेत बसलेली प्रतिमा आहे. दुसऱ्या मजल्यावर चार गर्भगृहे आहेत. पहिल्या गर्भगृहात असणाऱ्या बुद्धाच्या उजवा हात भूस्पर्श मुद्रेत असून डावा हात योगमुद्रेत मांडीवर ठेवलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचे गर्भगृह आकाराने छोटे आहे. यातही बुद्धप्रतिमा आहे. तिसरे गर्भगृह वरच्यापेक्षा खाली असल्यामुळे दोन तीन पायऱ्या उतरून खाली जावे लागते. चौथ्या गर्भगृहात व्याख्यान मुद्रेत बसलेल्या बुद्धाची प्रतिमा आहे. तिसरा मजला म्हणजे खूप मोठा प्रशस्त विहार आहे. विहारामध्ये ठिकठिकाणी खोदकाम सुरू केल्याच्या खुणा आहेत पण ते अर्धवट अवस्थेत सोडलेले आहे.
मानुषी बुद्ध म्हणजे मनुष्यजन्माच्या प्रत्येक कल्पामध्ये बुद्धावस्था प्राप्त झालेले. थोडक्यात बुद्धावतार. हीनयान व महायान पंथ २४ बुद्धावतार मानतात. पैकी महायान शेवटच्या सात अवतारांना मानुषी बुद्ध असे नाव देतात. शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे जसे हिंदू 'कल्की' यास भविष्यातील विष्णू अवतार मानतात.
हे सात मानुषी बुद्ध पुढीलप्रमाणे. यातील प्रत्येकास त्यांचा स्वतंत्र बोधीवृक्ष आहे.
१. विपश्यी
२. शिखी
३. विश्वभू
४. क्रकुच्छन्द
५. कनकमुनी
६. काश्यप
७. शाक्यमुनी
यातील सातव्या शाक्यमुनीलाच गौतम बुद्ध असेही मानले जाते.
गर्भगृहातील भूमीस्पर्श मुद्रेतील बुद्धप्रतिमा. बुद्धाने मारविजयानंतर भूमीला स्पर्श करून तिचे आवाहन केलेयाचे हे प्रतिक.
दुसर्या मजल्याची रचना
ओसरीतील स्तंभांवरील वाळूच्या घड्याळ्यासारखी दिसणारे नकसकाम
आतील भिंतींवरील बोधीसत्वाच्या मूर्ती असलेल्या चित्रचौकटी
तिसर्या मजल्यावरून दिसणारे प्रांगण
अंतराळाच्या मागे गर्भगृहात ध्यानस्थ बुद्धाची भव्य प्रतिमा असून भिंतीवर मैत्रेय, मंजुश्री, स्थिरचक्र आणि ज्ञानकेतू या चार बोधिसत्त्वांची शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस बुद्ध, ध्यानस्थ तारा, तर उजव्या बाजूस चुंडा या स्त्रीबोधिसत्त्व मूर्ती आहेत. वरच्या मजल्याच्या वाटेत भूमिस्पर्शमुद्रेत बुद्ध आहे. याशिवाय उजव्या भिंतीवर जंभाल (कुबेर), अवलोकितेश्वर आणि तारा यांच्या मूर्ती असून, डाव्या भिंतीवर नऊ मूर्तींचा मंडलपट आहे. सर्वांत वरच्या मजल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिल्पांची रेलचेल आणि स्थापत्यातील योजनाबद्ध रेखीवपणा. भिंतीवर बुद्धप्रतिमा कोरलेल्या असून काही ध्यानमुद्रेत, तर काही धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत दाखविल्या आहेत.
मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंस, प्रत्येकी सात यांप्रमाणे चौदा बुद्धमूर्तींची रांग कोरलेली आहे. या सात बुद्धमूर्ती ध्यानमुद्रेत असून, त्यांच्या मस्तकांच्या वर निरनिराळ्या वृक्षशाखा कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या दाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल आहेत. मंदिरात 3.35 मी. उंचीची भूमिस्पर्शमुद्रेतील बुद्धाची मूर्ती असून बुद्धाच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणापथ आहे. मूर्तीवर चुन्याच्या गिलाव्याचे अवशेष आढळतात, त्यावरून ही मूर्ती रंगविली जात असावी. छतावरही रंगकामाचे अवशेष आहेत. या रंगकामाचा काळ नववे शतक असा मानला जातो.
परंपरागत गवाक्षापासून वेगळेपण, आखणीतील भव्य परिमाणे, अनेक मजल्यांची खोदकामे आणि शिल्पांची रेलचेल ही वेरुळच्या बौद्ध लेण्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूला दोन सिंहप्रतिमा आहेत. आत समोरच चौकोनी प्रशस्त प्रांगण आहे. व्हरांड्यातील स्तंभांची रचना चौकोनी आहे. या लेण्याचा पहिला मजला अनेक स्तंभांनी आधारलेला आहे.या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये दगडी चौथरे व त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत. या लेण्यात मागच्या बाजूला गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बोधिसत्व कोरलेला आहे. त्याच्या डाव्या हातातील कमलपुष्पावर पुस्तक ठेवलेले आहे. गर्भगृहात आत सिंहासनावर धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील बुद्धप्रतिमा आहे.
दुसर्या मजल्यावर जाण्यास सभामंडपाच्या डावीकडच्या भिंतीतच सोपानमार्ग खोदला आहे. दुसर्या मजल्याची रचनासुद्धा पहिल्या मजल्यासारखीच पण इथे असलेली शिल्पे जास्त सुस्पष्ट आणि देखणी आहेत.
इथेही भिंतींवर पहिल्या मजल्यासारखीच बोधीसत्व प्रतिमा असलेली मंडळे आहेत.
उजव्या कोपर्यातील भिंतीवर रक्त अवलोकितेश्वर आणि त्याच्यासह स्त्री प्रतिमा अर्थात बोधीशक्ती आसनस्थ असून सर्वांनी हाती कमळे धारण केली आहेत.डावीकडील भिंतीवर रक्त अवलोकितेश्वर, डावीकडे स्त्री बोधीसत्व तारा वरदमुद्रेत आणि भ्रुकुटी पाण्याचा कुंभ घेऊन स्थापित आहेत.
रक्त अवलोकितेश्वर, तारा आणि भ्रूकुटी
रक्त अवलोकितेश्वर, तारा आणि भ्रूकुटी यांच्या
बद्धल अधिक माहिती अशी. अवलोकितेश्वर हा बोधीसत्वांमध्ये सर्वात प्रसिद्ध.
याचे प्रमुख लक्षण म्हणजे ह्याच्या हाती कमळ असते. अथांग करुणा हा ह्याचा
मुख्य गुणधर्म. हा स्वतःच्या निर्वाणाचा त्याग करून सर्वांच्या सुखाकरिता
झटत असतो.
अवलोकितेश्वरामध्ये सर्वच बुद्ध समाविष्ट होतात असे मानले जाते. तारा ही अवलोकितेश्वराची शक्ती किंवा स्त्री बोधीसत्व. तर भ्रूकुटी हे तारेचेच दुसरे रूप.अवलोकितेश्वर आणि तारा ह्यांचे रंगांनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. रक्त अवलोकितेश्वर हा लाल रंगात दाखवतात. वेरूळमधल्या ह्या मूर्टी तांबड्या रंगात रंगवलेल्या आढळून येतात म्हणून हे रक्त अवलोकितेश्वर आणि त्याची शक्ती रक्त तारा.
बाजूच्या भिंतींवर अशीच लहानमोठी शिल्पे असून समोर गर्भगृह आहे. द्वारपट्टीकेच्या एका बाजूला पद्मपाणी तर दुसरे बाजूस वज्रपाणी बोधीसत्व आहेत.
बोधीसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी
डावीकडच्या भिंतीतूनच तिसर्या मजल्यावर जायचा मार्ग आहे. येथेच भिंतीत एक दुमिळ शिल्पे आहे. ह्यात गौतमाने सत्य शोधण्यासाठी आपल्या राज्याचा त्याग केल्याचे दर्शवले आहे. ह्यात गौतम आपल्या घोड्यावर बसून आपले राज्य सोडून पुढे चालला आहे.
महान प्रवास
तिसरा मजला अवश्य पाहावाच असा. येथील भिंतींवरील शिल्पपटात बोधीसत्वांच्या भूमीस्पर्श, धम्मचक्रपरिवर्तन अशा विविध मुद्रेतील देखणी शिल्पे आहेत. तर मंडपाच्या समोरील बाजूस डावीकडे सात मानुषी बुद्ध तर उजवे बाजूस धम्मचक्रपरिवर्तन मुद्रेत बसलेले सात बोधीसत्व आहेत. बुद्ध असलेले दोन अतिभव्य असे शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटाचंच्या आतील बाजूस म्हणजेच गाभार्याच्या दोन्ही बाजूना तीन तीन बौद्ध देवतांच्या स्त्री प्रतिमा (बोधीशक्ती) कोरलेल्या असून द्वारपट्टीकेच्या दोन्ही बाजूंस दोन्ही हाताची घडी घातलेले बोधीसत्व द्वारपाल आहेत. कलचुरी शैलीचा मोठा प्रभाव ह्या हाताची घडी घातलेल्या द्वारपालांवर जाणवतो.
तिसरा मजला
तिसर्या मजल्याची साधारण रचना व त्यात असलेले शिल्पपट
धम्मचक्रपरिवर्तन मुद्रा
ध्यानमुद्रेत बसलेले सात मानुषी बुद्ध
धम्मचक्रपरीवर्तन मुद्रेत असणारे सात बोधीसत्व
गर्भगृहाच्या डाव्या बाजूस असलेल्या तीन स्बोधीशक्ती प्रतिमा
गर्भगृहाच्या उजव्या बाजूस असलेल्या तीन बोधीशक्ती प्रतिमा
हाताची घडी घातलेला बोधीसत्व द्वारपाल
संख्येने कमी असलेली एकूण पाच (क्र. ३० ते ३४ ही जैन धर्मीयांची गुहा-मंदिरे येथे आहेत. त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहावयास मिळतात. वेरूळची सर्वच जैन लेणी ही एकमेकांना लागूनच आहेत नव्हे तर वेगवेगळी नसून एकच आहेत. बाहेरून जरी प्रत्येकात शिरायचे मार्ग भिन्न दिसत असले तरी प्रत्यक्षात ही सर्वच लेणी आतून जोडलेली आहेत. त्यामुळे ३५ क्रमांकाच्या लेण्यात जाऊन आणि ३० व्या क्रमांकाच्या लेणीतून बाहेर येऊ शकतो. वेरूळाच्या जैन लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या भिंतींवर, छतावर महावीरांच्या आयुष्यावर आधारीत रंगीत चित्रे काढलेली आहेत. किंचित अजिंठ्याच्या शैलीतलीच ही चित्रे आहेत. या लेणीनंतर ही उत्तरकालीन अजिंठा चित्रशैली नामशेष झाली.जैन लेणी ही थोडी लांबवर असल्याने गाडी घेऊन जाणेच सोयीस्कर ठरते. अर्थात इथे जाण्यासाठी आपले खाजगी वाहन वापरण्याची परवानगी नाही.यासाठी असलेली सरकारी वाहनातूनच आपल्याला जावे लागते.या भागात असलेल्या उन्हाचा विचार करता वाहनातून थेट जैन लेणी बघायला गेलेले चांगले.
मंदीराच्या शिखराचे कैलास लेण्यच्या शिखराशी साम्य आहे. हे शिखर पायर्या,पायर्याचे आणि शंखाकार असुन माथ्याशी निमुळते आहे. शिखराच्या प्रत्येक मजल्याच्या कोपर्यात कूट शिखरे असून मधोमध कुट प्रयोजने आहेत. गाभाऱ्यात महावीरांची मूर्ती आहे. हे मंदिर कमालीचे सुंदर आणि नक्षीदार आहे. इथेही बौद्ध लेण्यांप्रमाणेच पिंपळाकार कमानी दिसतात. पण बौद्ध लेण्यांच्या कलेकडून जैन लेण्यांच्या कलेकडे स्थित्यंतर होताना काळाच्या प्रवाहात मूळचे कमानदार निमुळते आकार डेरेदार झालेले दिसतात तर स्तंभांवरील नक्षीकाम देखणे झालेले दिसते तसेच विश्रांतीकक्ष दिसून येत नाहीत. लेणीतच उजव्या बाजूला एक कैलाश लेणीप्रमाणेच एक भव स्तंभ असून त्यावर चतुर्मुखी ब्रह्मयक्षाची प्रतिमा कोरलेली आहे. ८.२६ मीटर उंचीच्या एकाश्म स्तंभ उत्तर राष्ट्रकुट शैलीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मंदीराच्या समोर असे स्तंभ उभारण्याची पध्दत नंतरच्या काळात दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली. डाव्या बाजूला एकाच पाषाणात घडवलेली हत्तीची सुस्थितीतील मूर्ती आहे. हा हत्ती कैलास लेण्याची आठवण करुन देतो.
अजूनही कित्येक प्रसंग ह्या लेणीच्या भिंतींवर कोरलेले आहेत पण त्यामागच्या कथा समजत नाहीत पण इथले मूर्तीकाम अतिशय सुरेख आहे. ह्या लेणीचा अंर्तभाग हाच इंद्रसभेचा बाह्यभाग आहे. किंबहुना ही पाचही लेणी इतकी अभिन्न आहेत की यांचे वर्णन लिहितांना यांचा वेगळा विचार करून लिहिणे अशक्यच आहे.वास्तविक हे लेणीसंकुल म्हणजे वेगवेगळ्या लेणी नसून एकाच लेणीचे हे वेगवेगळे विभाग आहेत असेच समजावे.
![]() | |
![]() |
इंद्रसभेतून दिसणारे छोटा कैलास
छोटा कैलासचे संपूर्ण दर्शन
इथेही बौद्ध लेण्यांप्रमाणेच पिंपळाकार कमानी दिसतात. पण बौद्ध लेण्यांच्या कलेकडून जैन लेण्यांच्या कलेकडे स्थित्यंतर होताना काळाच्या प्रवाहात मूळचे कमानदार निमुळते आकार डेरेदार झालेले दिसतात तर स्तंभांवरील नक्षीकाम देखणे झालेले दिसते तसेच विश्रांतीकक्ष दिसून येत नाहीत.
लेणी क्र. ३१ वरून दिसून येत असलेली तीमजली रचना
कमानींची बदललेली रचना आणि तीर्थकरांचे प्रसंग
गोमटेश्वर, मातंग यक्ष, सिद्धायिका आणि महावीरांच्या मूर्ती कोरलेला शिल्पपट
गज आणि व्याल प्रतिमा
पार्श्वनाथ हे तेवीसावे तीर्थंकर. यांची तपस्या भंग करण्यासाठी कमठ या राक्षसाने हरतर्हेचे प्रयत्न केले. त्यावेळी धरणेंद्र यक्ष आणि त्याची पद्मावती यांनी पार्श्वनाथांचे संरक्षण केले. धरणेंद्राने आपला सप्तफणा पार्श्वनाथांच्या मस्तकी धारण केला आहे आणि आपल्या शरीराच्या वेटोळ्यांनी त्यांच्या शरीराचे कमठापासून संरक्षण केले आहे.बुद्ध, बुद्धशत्रू मार आणि बुद्धाचे नागराज अनुयायी नंद आणि अनुपनंद यांच्यासारखीच ही कथा.
पार्श्वनाथ आणि कमठाची कथा
महावीर मंदिराच्या बाहेर असलेला स्तंभ (ओबेलिस्क) आणि त्यावरील चतुर्मुखी ब्रह्मयक्ष
मंदिर कळस आणि स्तंभ
सुस्थितीत असलेली गजप्रतिमा
या पुढे एक साधेसे लेणे असून आतमध्ये स्तंभ आणि महावीराच्या प्रतिमेशिवाय काहीही नाही.
ह्या संपूर्ण लेणीसमूहाचा बाह्यभाग
डावीकडची जगन्नाथसभा, मधली कातळाआड दडलेली इंद्रसभा आणि उजवीकडे छोटा कैलास.
छोटा कैलास लेण्यावर हिंदु लेणे मंदीर कैलास लेण्याचा प्रभाव आहे.थोडे निरीक्षण केले तर आपल्याला या दोन्ही लेण्यातील साम्य दिसून येते.
क्रमांक ३१ : क्रमांक ३१ ते ३४ ही लेणी एकमेकांस लागून खोदलेली आहेत. पहिल्या लेण्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. सभामंडपात गोमटेश्वराची कार्योत्सर्गमुद्रेत उभी मूर्ती असून तिच्या समोर पार्श्वनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे. गर्भगृहात महावीराची ध्यानमुद्रेतील प्रतिमा असून वर पुष्पमाला घेतलेले गंधर्व विहार करीत आहेत. गर्भगृहाच्या बाहेर डाव्या बाजूस वटवृक्षाखाली असलेली मातंगाची, तर उजव्या बाजूला आम्रवृक्षाखाली सिंहासनारूढ सिद्धायिकेची मूर्ती कोरली आहे. जैन परंपरेप्रमाणे महावीर तीर्थंकराशी मातंग यक्ष म्हणून, तर सिद्धायिका शासनदेवता म्हणून निगडित आहेत.
क्रमांक ३२ :
मुख्य लेण्यात गेल्यावर अग्रमंडपात एक महत्त्वाचा पुरावा दिसून येतो. एका खांबावर तांबड्या गेरूने तीर्थंकर प्रतिमेचे रेखाटन केल्याचे दिसते. त्यानुसार मूर्ती घडविली जाई, असे स्पष्ट होते. याच मंडपातील दुसऱ्या एका खांबावर तीर्थंकार प्रतिमेखाली `नागवर्मकृत प्रतिमा’ असा उत्कीर्ण लेख असून, दुसऱ्या एका खांबावर `श्री सोहिलब्रह्मचारिणी शांतिभट्टारक प्रतिमेयम्’ असा लेख शांतिनाथ तीर्थंकराच्या प्रतिमेखाली आहे. देवनागरीतील हा शिलालेख यादवकाळातील असावा. राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर येथे यादवांचे साम्राज्य आले व तेव्हाही ह्या जैन लेणीत मूर्ती कोरणे सुरुच होते. श्री सोहिल ब्रह्मचारिणा शांति भट्टारक प्रतिमेयम - म्हणजे सोहिल नामक ब्रह्मचार्यासने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरली आहे.
मंडपाचे खांब घटपल्लव आणि इतर शिल्पे यांनी सुशोभित केले आहेत, छतावर कमळ कोरलेले आहे. मंडपाच्या मागील भिंतीत पार्श्वनाथ, महावीर व गोमटेश्वर यांच्या प्रतिमा आहेत. या मंडपाच्या छतावर चित्रकारीचे पुसट अवशेष दिसतात.
वास्तविक जैन धर्मामध्ये इंद्र आदी देवतांचे बरेच उल्लेख आहेत पण ह्या लेण्यामध्ये इंद्राचा तसा काहीही संबंध नाही. येथील गर्भगृहाच्या दाराच्या डावीकडे हत्तीवर बसलेल्या मातंग यक्षाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे तर दुसऱ्या बाजूला सिद्धायिकेची सुंदर मूर्ती आहे. ह्या दोन मूर्तींकडे पाहूनच ह्यांना इंद्र आणि इंद्राणीच्या मूर्ती समजले गेले आणि लेण्याचे नामकरण इंद्रसभा असे झाले. इंद्राशी काहीही संबंध नसला तरीही ह्या लेणीचे काम अगदी इंद्राच्या राज्यसभेला साजेसे असे कमालीचे देखणे आणि सुबक झालेले आहे.

इंद्रसभा हे लेणेसुद्धा जगन्नाथसभेसारखेच दुमजली असून त्याची रचना पण त्यासारखीच आहे. मात्र इंद्रसभेतल्या मूर्तीचे कोरीव काम अतिशय सुबक आहे तर इथल्या स्तंभांवरचे नक्षीकाम कमालीचे नाजूक आहे. इंद्रसभेतील इतर मूर्तीमध्ये पार्श्वनाथ, गोमटेश्वर, महावीर इत्यादी तीर्थकरांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या असून स्तंभांवर अतिशय देखणे नक्षीकाम केले आहे. इंद्रसभेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ओसरीतील मातंग यक्ष आणि सिद्धायिकेच्या प्रतिमा. हत्तीवर मातंग यक्ष एक पाय खाली सोडून बसलेला आहे. मस्तकी मुकूट, गळ्यांत हार, बाजूबंद, कमरपट्टा त्याने परिधान केलेला आहे तर जानव्यासदृश एक हार त्यांच्या खांद्यावरून पोटाच्या बाजूने गेलेला दिसतो आहे. त्याचे वाहन असलेल्या हत्तीच्या मस्तकीही मोत्यांचे दागिने दिसत आहेत तर बाजूलाच दोन सेवक आज्ञापालनासाठी उभे आहेत. यक्षाच्या डोक्यावर वटवृक्षाच्या पर्णसंभाराने छाया धरली असून पानांच्या शिराही अगदी स्पष्टपणे कोरलेल्या आहेत तर त्या वॄक्षाच्या डेऱ्यावर मयुर पक्षी विहरतांना दाखवले आहेत. अशा ह्या सुंदर मूर्तीला इंद्र समजले जाणे यात काहीच नवल नाही. ही अतिसुंदर मूर्ती कोरतांनाही यक्षांची स्थूल तनु, सुटलेले पोट, मोठे डोळे आणि ठेंगणेपणा आदी मूळ वैशिष्ट्ये येथेही कायम ठेवलेली आहेत. ओसरीत एका बाजूला सिद्धायिकेची तितकीच देखणी मूर्ती कोरलेली आहे. सिद्धायिका ही सिंहावर आरूढ असून एक हात तिने आशीर्वादपर मुद्रेत उंचावला असून दुसर्यास हाताने तीचे लहान मूल ती सांभाळत्ये आहे. हिच्याही अंगाखांद्यावर अनेक अलंकार असून बाजूला सेवक हीची आज्ञा झेलण्यासाठी सज्ज आहेत. हिच्या मस्तकी आम्रवृक्षाच्या पर्णसंभार दाखवलेला असून वृक्षाला फळेही लागलेली आहेत. जणू मातृरूपी शक्तीचे हे एक प्रतिकच आहे. वृक्षात मधूनच फळ खायला आलेले एक मर्कट कोरलेले असून वरच्या बाजूला मोर कोरलेले आहेत. सिद्धायिका ही सुद्धा देवी नसून यक्षिणीच मानली जाते. ह्या लेणीतसुद्धा काही चित्रे कोरलेली आहेत. इथली चित्रे बरीचशी खराब झाल्यामुळे तशी अस्पष्टशी आहेत. जगन्नाथसभेच्या वरच्या मजल्यावरून इंद्रसभेच्या वरच्या मजल्यावर आपला प्रवेश होतो व दुसऱ्या बाजूने एका जिन्याने आपण इंद्रसभेच्या तळमजल्यावर येतो.
इंद्रसभेतील इतर मूर्तीमध्ये पार्श्वनाथ, गोमटेश्वर, महावीर इत्यादी तीर्थकरांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या असून स्तंभांवर अतिशय देखणे नकसकाम केले आहे.
इंद्रसभेचा अंतर्भाग
स्तंभांवरील सुरेख नक्षीकाम
भिंतीवर कोरलेली मातंग यक्ष प्रतिमा सभामंडपातील कोरीव स्तंभ
गोमटेश्वर
पार्श्वनाथ
![]() |
| Inside the cave on the second floor |
![]() |
| Another mesmerised tourist |
इंद्रसभेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ओसरीतील मातंग यक्ष आणि सिद्धायिकेच्या प्रतिमा.
हत्तीवर मातंग यक्ष एक पाय खाली सोडून बसलेला आहे. मस्तकी मुकूट, गळ्यांत हार, बाजूबंद, कमरपट्टा त्याने परिधान केलेला आहे तर जानव्यासदृश एक हार त्यांच्या खांद्यावरून पोटाच्या बाजूने गेलेला दिसतो आहे. त्याचे वाहन असलेल्या हत्तीच्या मस्तकीही मोत्यांचे दागिने दिसत आहेत तर बाजूलाच दोन सेवक आज्ञापालनासाठी उभे आहेत. यक्षाच्या डोक्यावर वटवृक्षाच्या पर्णसंभाराने छाया धरली असून पानांच्या शिराही अगदी स्पष्टपणे कोरलेल्या आहेत तर त्या वॄक्षाच्या डेर्यावर मयुरादी पक्षी विहरतांना दाखवले आहेत.
अशा ह्या सुंदर मूर्तीला इंद्र समजले जाणे यात काहीच नवल नाही. ही अतिसुंदर मूर्ती कोरतांनाही यक्षांची स्थूल तनु, सुटलेले पोट, मोठे डोळे आणि ठेंगणेपणा आदी मूळ वैशिष्ट्ये येथेही कायम ठेवलेली आहेत.
मातंग यक्ष प्रतिमा
ओसरीत एका बाजूला सिद्धायिकेची तितकीच देखणी मूर्ती कोरलेली आहे.सिद्धायिका ही सिंहावर आरूढ असून एक हात तिने आशीर्वादपर मुद्रेत उंचावला असून दुसर्या हाताने तीचे लहान मूल ती सांभाळत्ये आहे. हिच्याही अंगाखांद्यावर अनेक अलंकार असून बाजूला सेवक हीची आज्ञा झेलण्यासाठी सज्ज आहेत. हिच्या मस्तकी आम्रवृक्षाच्या पर्णसंभार दाखवलेला असून वृक्षाला फळेही लागलेली आहेत. जणू मातृरूपी शक्तीचे हे एक प्रतिकच आहे. वृक्षात मधूनच फळ खायला आलेले एक मर्कट कोरलेले असून वरच्या बाजूला मोर कोरलेले आहेत.सिद्धायिका ही सुद्धा देवी नसून यक्षिणीच मानली जाते.
![]() |
| A beautiful idol at a Jain temple at Ellora |
सिद्धायिका शिल्पप्रतिमा
लेणे क्र. ३२ च्या खालच्या मजल्यावर असलेली नागवर्मा आणि सोहीला यांची प्रतिमा. तसेच उजव्या बाजुच्या शिल्पात कैलासनाथ मंदीराचे पुजा करणारे भाविक दाखवले आहेत.
ह्या लेणीतसुद्धा काही चित्रे कोरलेली आहेत. इथली चित्रे बरीचशी खराब झाल्यामुळे तशी अस्पष्टशी आहेत.
प्रवचन ऐकतांना स्त्रीयांची चित्रे
प्रवचन ऐकतांना हात जोडलेले पुरुष
छतावर रंगवलेल्या विविध प्रतिमा
अंगावरील दागिने कमालीचे देखणे रंगवलेले आहेत.
इथल्या सज्जावरून लेणी क्र. ३१ अर्थात मिनी कैलासचे अतिशय सुरेख दर्शन होते. किंबहुना इंद्रसभेचा जो बाह्यभाग आहे तोच छोटा कैलासचा अंर्तभाग आहे.
![]() |
![]() |
![]() |
इंद्रसभेचा बाह्यभाग
सुबक कोरीवकाम
जगन्नाथसभेच्या वरच्या मजल्यावरून इंद्रसभेच्या वरच्या मजल्यावर आपला प्रवेश होतो व दुसर्या बाजूने एका जिन्याने आपण इंद्रसभेच्या तळमजल्यावर येतो. तळमजल्यावरही मातंग यक्ष, सिद्धायिका, गोमटेश्वर, पार्श्वनाथ, महावीर आदी मूर्ती कोरलेल्या आहेत.
मातंग यक्ष, सिद्धायिका आणि गर्भगृहातील महावीर
गोमटेश्वराची गंधर्वांसहित देखणी प्रतिमा
इथल्याच एका भिंतीवर देवनागरीत एक शिलालेख कोरलेला आहे. माझ्यामते हा शिलालेख यादवकाळातील असावा. राष्ट्रकूटांच्या अस्तानंतर येथे यादवांचे साम्राज्य आले व तेव्हाही ह्या जैन लेणीत मूर्ती कोरणे सुरुच होते.
श्रीसोहिल ब्रह्म
चारिणा शान्ति भट्टा
रक प्रतिमेय
श्री सोहिल ब्रह्मचारिणा शांति भट्टारक प्रतिमेयम - म्हणजे सोहिल नामक ब्रह्मचार्याने शांतिनाथ तीर्थकरांची ही मूर्ती कोरली आहे
शिलालेख
ह्यानंतरची चित्रे बघण्यासाठी आपल्याला थेट जैन लेणीतील इंद्रसभा व जनन्नाथसभा ह्या दोन लेण्यांत जावे लागते. ह्या दोन्ही लेण्यांच्या भव्य मंडपात छतावर व भिंतींवर असंख्य चित्रे आहेत जी बघण्यासाठी विजेरीशिवाय पर्याय नाही.
छतावर रंगवलेले भगवान महावीरांचे ध्यानमुद्रेतील चित्र.
दोन स्तंभांदरम्यान असलेले छतावरील रंगकाम
भवान महावीरांचे अनुयायांसह असलेले प्रवचनमुद्रेतले चित्र
अतिशय सुरेख समतोल साधला गेलाय ह्या चित्रामध्ये.
हे अजून एक नृत्यमुद्रेतील चित्र
येथे सर्व स्त्रिया बसून बहुधा महावीरांच्या प्रवचनाचे श्रवण करत असाव्यात असा त्यांच्या हात जोडलेल्या अवस्थेवरुन तर्क लावता येतो.
झूम इन
येथे पुरुषप्रतिमाही तशाच मुद्रेत आहेत.
हे अक अत्यंत पुसट असे चित्र
हे चित्र थेट अजिंठ्यातील १७ व्या क्रमांकाच्या लेण्यातील ओसरीचे भितीवर रंगवलेल्या वेस्संतर जातकातील चित्राची आठवण करुन देते.
नृत्य का ध्यान का दोन्ही?
हे बहुधा घोडे, हरिण दिसत आहेत.
महावीरांची ध्यानमुद्रा व त्याखाली भलाथोरला वृक्ष
सर्वात उजवीकडे वाघावर स्वार असा कुणीतरी दिसतोय.
स्तंभांवरची देखणी नक्षी
स्तंभांदरम्यानच्या छतावरची देखणी नक्षी
छतावरील नक्षीचे अवशेष
छतावरील नक्षीचे अवशेष
गोमटेश्वराचे चित्र. महावीर छातीपर्यंत येणार्या जलामध्ये उभे राहून तप करत आहेत. त्यांच्या हातापायांना वेलींनी विळखा घातलेला आहेत तर बाजूला दोन अनुयायी आहेत.
वरील चित्र इंद्रसभेतील मुख्यमंडपाच्या बाहूस असलेल्या उपलेण्यात आहे. ह्या मुख्य मंडपाचे दोन्ही बाजूस अशीच उपलेणी असून त्या तील गाभार्यात अत्यंत अंधारात ही चित्रे रंगवलेली आहेत. ही चित्रे शोधणे माहितगाराशिवाय दुरापास्त आहे. संपूर्ण गाभार्याच्या तिन्ही बाजूच्या भिंती, छत यांवर ही चित्रे कोरलेली आहेत. गाभार्याचे दरवाजाचे आतील दोन्ही बाजूचे भिंतीवर एकीकडे गोमटेश्चर तर दुसरीकडे पार्श्वनाथ आणि इतर बाजूस व छतांवर वेगवेग़ळे प्रसंग तसेच नक्षीकाम. यातील पार्श्वनाथाचे चित्र मजकडून गहाळ झाले. ह्या उपलेण्यांतीलच अजून काही चित्रे आपण पाहूयात.
गोमटेश्वर मुखदर्शन
छतांवरील रंगकाम
हे एक अतिशय देखणे चित्र
चित्रपट्टीका
फुलाचे देखणे रंगकाम
ही एक देखणी जोडी
ही अजून एक चित्रपट्टीका
झूम इन
ही अजून एक नृत्यमुद्रा
ह्यांचे दागदागिने अगदी उठून दिसत आहेत.
खाली दिलेले चित्राविषयी थोडा संभ्रम आहे. ह्या चित्रात नर्तिकेला (का नर्तकाला?) आठ हात दाखवलेले असून ती एका लयीत नृत्य करीत आहे. दोनपेक्षा जास्त असलेली चित्रे जैन लेण्यांत बहुधा नाहीतच. डाव्या बाजूचे खालचे बाजूस वादक तबला व डग्गा वाजवत आहेत. तबल्याचे हे बहुधा सर्वात प्राचीन चित्रांकन असावे.
आठ हात जरी असले तरी हे जैन लेणीतील चित्र असल्याने हा नटराज शिव निश्चितच नाही हा तर्क सहजच काढता येतो. मग हे चित्र कोणाचे असावे असा प्रश्न उपस्थित होतो.अंदाजाप्रमाणे हे चित्र बहुधा चक्रेश्वरी यक्षीचे असावे. ८ हात हे तिचे एक लक्षण आहे.
हेच ते चित्र
वेरूळ लेण्यातील या चित्रांवर अलीकडेच संशोधन होउन काही नवीन माहिती समोर आली आहे, त्याविषयी. वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणीच्या गिलाव्यात सापडलेल्या गूढ वनस्पतीबाबतच्या संशोधनावर डॉ. मिलिंद सरदेसाई, वनस्पतिशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी काम केले.त्यांनी नोंदवलेली निरिक्षणे त्यांच्याच शब्दात .
मी पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत होतो. एक दिवस तेथील तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी दुपारी चारच्या सुमारास मला चहाला येण्यासाठी निरोप दिला. तिथे पोहोचलो, तर त्यांच्या कक्षात आधीपासूनच एक व्यक्ती बसली होती. चहा घेत असताना बसलेल्या व्यक्तीची ओळख करून दिली. ते होते डॉ. मॅनेजर सिंग. ते तेव्हा केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागात मोठ्या पदावर कार्यरत होते. ते ज्या कामासाठी आले होते, ते आगळेवेगळे होते.
बाराव्या गुहेमधील गिलावा:-
मॅनेजर सिंग हे वेरूळच्या लेण्यांमधील १२ व्या गुहेमधील भित्तीचित्रांच्या गिलाव्याचा एक तुकडा घेऊन आले होते. तो गुहेत खाली पडलेला एक छोटासा नमुना होता. त्यांनी तो छोट्या प्लास्टिकच्या पिशवीतून आणला होता. हा नमुना साधारणतः ५ व्या किंवा ६ व्या शतकातील होता. चहा घेतच त्यांनी ती पिशवी माझ्याकडे दिली. ती जवळून पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की त्या मातीमध्ये कोणत्या तरी वनस्पतीचे तुकडे आहेत. त्यांनी मला ती वनस्पती ओळखण्याबाबत विचारले. माझ्या मनात प्रश्न आला की ती वनस्पती कोणती आहे ओळखून उपयोग काय? हा प्रश्न मी त्यांना बोलून दाखवला. त्यांनी सांगितले की, एकदा का ही वनस्पती ओळखता आली की तिचा वापर करून वेरूळच्या गुहांमधील भित्तिचित्रांच्या संवर्धनाचे काम करणे सोपे होईल. त्यांनी सांगितलेली बाब महत्वाची होती. जाता जाता त्यांनी एक अटही घातली. ती अशी की त्यांनी मला दिलेल्या नमुन्यांची हाताळणी केवळ मीच करावी.
मी जवळपास गेली दोन दशके वनस्पती वर्गीकरणशास्त्राचा अभ्यास करत आलो होतो. असे असले तरीही मी या आधी अशा प्रकारचा नमुना कधीही अभ्यासला नव्हता. वनस्पती वर्गीकरणशास्त्रानुसार कोणत्याही वनस्पतीची ओळख अचूक होण्यासाठी पाने, फुले आणि शक्यतो फळे असणारी फांदी असावी लागते. तरच ओळख सोपी आणि अचूक होऊ शकते. मी म्हटले की हे थोडसे अवघड काम आहे आणि यासाठी वेळ लागू शकतो.
एका अवघड शोधमोहिमेची सुरुवात
त्यानंतर अनेक महिने मी याच कामावर लागलो होतो. वेरूळ व इतर भागातील भौगोलिक परिस्थिती, तेथील तत्कालीन पीक - पाणी, गुहा कशी खोदली जाते, त्यामध्ये कोरली जाणारी लेणी आणि भित्तिचित्रांची निर्मिती, कोणत्याही बांधकामामध्ये गिलावा करताना त्यामध्ये कोणकोणत्या वनस्पतींचे मिश्रण घातले जात... याबाबतचे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ मिळतात का, हे शोधण्याच्या मागे लागलो.
#वेरूळ हे एक छोटेसे गाव. ते औरंगाबादच्या उत्तरेला साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर एलगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. एलगंगा नदीवरूनच त्याचे मूळ नाव एलूर, तद्नंतर एल्लापुरा आणि सरतेशेवटी वेरूळ असे झाले. ब्रिटिश राजवटीनंतर ते एलोरा नावानेच जगभर ओळखले जाऊ लागले. तिथे अगदी गावानजिकच असलेल्या डोंगरांमध्ये अनेक मानवनिर्मित गुहा आहेत. सध्या सर्व लेणी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. त्यातील ४० लेणी पुरातत्व विभागाने सर्वसामान्यांसाठी खुली केली आहेत. यातील १ ते १२ लेणी भगवान गौतम बुद्ध, त्यांच्या जीवनातील प्रसंग, बौद्ध धर्म याबाबत आहेत. पुढे लेणी क्र. १३ ते २९ अशा एकूण १७ लेणी या हिंदू धर्माविषयी, तर लेणी क्र. ३० ते ३४ या जैन धर्मविषयक दर्शन घडवितात. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या तीन धर्मांची महती सांगणारे वेरूळ वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण ठरते. ही लेणी म्हणजे बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मगुरू, यात्रेकरू, वाटसरू व इतरांसाठी प्राचीन काळामध्ये व्यापारी मार्गावरील एक ठिकाणही होते. या लेण्यांच्या निर्मितीचा कालखंडही वेगवेगळा आहे. पहिल्या १२ बौद्ध लेणी साधारणतः ५ ते ७ व्या शतकात घडविल्या गेल्या. पुढील १३ ते २९ ही हिंदू लेणी आठव्या व नवव्या शतकाच्या दरम्यान, तर शेवटच्या ५ जैन लेणींची निर्मिती नवव्या ते अकराव्या शतकादरम्यान झाली. सोळाव्या लेणीतील कैलास मंदिर हे केवळ एका दगडामध्ये कोरलेले असल्यामुळे ते शिल्पकलेतील जागतिक आश्चर्य मानले जाते. भारत सरकारने त्याला इसविसन १९५१ साली राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता दिली. त्यानंतर इसविसन १९८३ मध्ये युनेस्कोने त्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला.
डॉ. मॅनेजर सिंग यांनी १२ क्रमांकाच्या लेणीच्या भित्तिचित्राच्या गिलाव्याचे नमुना घेतले होते, ती तीन मजली आहे. ती बौद्ध भिक्कू, उपासक आणि अभ्यासक यांच्याकडून उपयोगात आणली जात असावी. या लेणींची निर्मिती तत्कालीन, स्थापत्यकलेतील तज्ज्ञ आणि कारागिरांनी वेरूळच्या डोंगरांमधील अग्निजन्य खडक फोडून केली आहे. तिची निर्मिती अतिशय उच्च पातळीची आहे. गुहेतील दगडी ओबडधोबड भिंतींवर स्थानिक चिकण माती आणि इतर घटक वापरून गिलावा करण्यात आला. या मातीच्या थरावर अजून दोन थर चुन्याचे देऊन त्यावर चित्रे काढली गेली. सुदैवाने किंवा दुर्दैवाने वेरूळची लेणी सुरुवातीपासूनच स्थानिक जनता, वाटसरू आणि इतरांच्याही दृष्टिपथात राहिला. विविध आक्रमणे, समाजकंटकांचा उपद्रव आणि काळाच्या ओघात अनेक मूर्ती आणि भित्तिचित्रांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
उलगडा होण्याच्या दिशेने...
हे सर्व पैलू समजून घेत दरम्यानच्या काळात रोज काही वेळ मातीचा एक एक कण सूक्ष्मदर्शकाखाली पाहत होतो. त्यात काही सापडतेय का हेही शोधत राहिलो. सुदैवाने मला त्यामध्ये काही धागे, पानांचे छोटे तुकडे आणि एक फूल मिळाले. पानांचा रंग बऱ्यापैकी हिरवा होता. पण फुलातील आतील सर्वच भाग गायब होते, पण त्याच्या पाच पाकळ्या मात्र बऱ्यापैकी सुस्थितीत होत्या. वनस्पतिशास्त्राच्या वर्गीकरण शास्त्राच्या नियमानुसार, झाडाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी इतके पुरावे पुरेसे होते. यासाठी वर्गीकरण अद्ययावत सिस्टिमचा मात्र काहीच उपयोग झाला नाही. याउलट साधारणतः दीडशे वर्षांहून जुनी असणारी जॉर्ज बेंथाम आणि जोसेफ हूकर यांनी शोधलेली सिस्टिम मात्र उपयोगात आली. त्यानुसार परीक्षण केल्यानंतर असे लक्षात आले की हे फूल द्विदल वनस्पतींच्या 'अपेटाली' वर्गात बसत आहे. अपेटाली समूहातील वनस्पतींच्या फुलांमध्ये पाकळ्यांचे एकच दल असते.
पुरातत्वशास्त्राच्या नियमानुसार, ऐतिहासिक काळातील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कोणत्याही निर्माणकार्यात स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या वस्तू व साधनांचाच वापर केला जातो. म्हणजेच या लेणीत वेरूळ आणि आसपासच्या भागात ज्या वनस्पती उगवतात, त्यातलीच एखादी वापरली गेली होती. सुदैवाने स्व. वा. ना. नाईक आणि त्यांच्या विद्यार्थ्यानी लिहिलेला मराठवाड्याचा वनस्पती कोष आणि नोंदविलेल्या प्रत्येक वनस्पतींच्या जातीचे जतन केलेले शुष्क नमुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्राच्या संग्रहालयात उपलब्ध आहेत.
सांगता काय... गांजा?
मग मराठवाड्यात आढळणाऱ्या अपेटाली वर्गातील सर्व जातींची एक यादी केली. सोबत वेरूळच्या गुहेतील भित्तिचित्रात मिळालेल्या फुलाचा नमुना होताच. त्याची माजमापे आणि पाकळ्यांचा आकार इत्यादींचा वापर करून तयार केलेल्या यादीतील वनस्पतींशी तुलना केल्यावर केवळ तीनच जाती शिल्लक राहिल्या. या तीनही जातींचे शुष्क नमुने तपासले, त्यातही दोन जुळल्या नाहीत. शेवटी एकच शिल्लक राहिली, आणि तो होता गांजा. दुर्दैवाने तुलना करण्यासाठी गांजाचे नमुने मात्र संग्रहालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे तो गांजाच आहे हे पक्के व्हायचे बाकी होते. सहकारी आणि मित्रांना हे सांगितले. गांजा म्हटल्यावरच त्यांच्यासह अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण गांजाचे नमुने नसल्याने तुलना करायची तर कशी?
त्यातूनही मार्ग निघाला. दिल्लीसह उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये निसर्गतःच गांजा अगदी गाजर गवताच्या बरोबरीने तण म्हणून वाढतो. मग दिल्लीतून काही नमुने मागविले आणि त्याची तुलनात्मक चिकित्सा केली. मग असे लक्षात आले की गिलाव्यात वापरलेली वनस्पती गांजाच आहे. पुढे त्यातील बारकाव्यांचा शोध साध्या आणि इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली घेतला. तसेच, त्याचे रासायनिक परीक्षणही केले. त्यानंतर ती वनस्पती गांजा असण्यावर शिक्कामोर्तब झाले. पण त्यामुळे तिथे गांजाच का वापरला आणि किती प्रमाणात वापरला? त्याची लागवड केली जात होती की तो नशेसाठी वापरला जात होता? असे अनेक प्रश्न उभे राहिले.
वेगळ्याच कारणासाठी जगभर प्रसार
ही वनस्पती होती, ‘कॅनाबीस सॅटिवा’ (Cannabis sativa). ती भारतीय उपखंडात गांजा, भांग, चरस, हशीष इत्यादी नावांनी ओळखली जाते. गांजाची लागवड सर्वसाधारणतः दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी चीनच्या उत्तरेकडील भागामध्ये झाली. लागवडीचा मूळ उद्देश मात्र त्याच्यापासून मिळणारा धागा हा होता. प्राचीन काळी बहुतांश जहाजे, बोटी, किंवा इतरत्र वापरल्या जाणाऱ्या दोरखंडांमध्ये गांजापासून तयार केलेल्या दोरखंडांचे प्रमाणच सर्वांत मोठे होते. आणि त्यासाठीच त्याचा प्रसार जगभर झाला. भारतीय भूमीत गांजा साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमार्गे आला आणि प्राचीन व्यापारी मार्गांवरून तो दक्षिणेत पोहोचला.
कालांतराने घायपातासारख्या झाडांपासूनसुद्धा दोर बनविले जाऊ लागले आणि गांजाच्या दोराचे महत्व कमी होत गेले. परंतु, त्यानंतर मात्र गांजाचा उपयोग वेगळ्या कारणासाठी वाढला. त्याच्या नशा आणणाऱ्या गुणधर्मासाठी तो अधिक प्रमाणात वापरला जाऊ लागला. तो इतका वाढला की अगदी भारतीय संस्कृतीचा भागच होऊन गेला. ब्रिटिशांना इसविसन १८६० च्या दरम्यान गांजावर अगदी कर लावला. गांजामध्ये असणारा ‘टेट्राहैड्रोकॅनाबिनॉल’ हा घटक असतो. तोच नशा आणण्यासाठी वापरला जातो. गांजाचे वैशिष्ट्य म्हणजे याची नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडे असतात. नर झाडामध्ये ‘टेट्राहैड्रोकॅनाबिनॉल’ अतिशय कमी प्रमाणात असतो, तर तो मादी झाडामध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. याचाच अर्थ मादी झाड अधिक मादक असते. उत्तर भारतामध्ये गांजा तण म्हणून मुबलक प्रमाणात वाढतो. गांजामध्ये बुरशीरोधक तसेच कीडरोधक असे गुणधर्मही असतात. त्यामुळे त्याच्यापासून वापरलेल्या गोष्टी आर्द्रता असली तरी लवकर खराब होत नाहीत. त्यामुळेच कदाचित गांजा वेरूळ लेण्यांमधील भित्तिचित्रांच्या गिलाव्यात वापरला गेला असावा.
गांजाच्या धाग्यांचे असेही गुणधर्म
याची उदाहरणे जगाच्या इतर भागातही पाहायला मिळतात. विशेषत: इंग्लंडमधील जुन्या दगडी इमारतींच्या बांधकामांमध्येही गांजाचे धागे आढळतात. त्याचा वापर प्रामुख्याने उष्णता अवरोधक म्हणून होतो. युरोपमध्ये हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात असणाऱ्या तापमानामध्ये होणाऱ्या बदलांचा इमारतीच्या अंतर्गत भागात फारसा फरक पडत नाही. पण या इमारतींमध्ये वावरणाऱ्या लोकांच्या घामामुळे, श्वासोश्वासामुळे किंवा इतर कारणामुळे निर्माण होणारी आर्द्रता शोषून घेण्याचे कामही हे गांजाचे धागे करतात. त्यामुळे दमटपणामुळे भिंतींवर तयार होणारी बुरशी किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. कदाचित हेच तंत्र आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपूर्वी वापरले असावे. वेरूळच्या या गुहांमध्ये शेकडो वर्षे इतकी माणसे वावरली असतील, त्याद्वारे तयार झालेली आर्द्रता भित्तिचित्रांच्या गिलाव्यामध्ये वापरलेल्या गांजाने शोषली असेल. गांजामध्ये असलेल्या बुरशी आणि कीडरोधक गुणधर्मामुळे आजही जवळपास १५०० ते १६०० वर्षानंतरही ही सर्व भित्तिचित्रे अजूनही शाबूत आहेत. मराठवाड्यातील तापमानात मोठी विषमता आहे. पण गांजाच्या उष्णतारोधक गुणधर्मामुळे या विषमतेचाही त्यावर फार मोठा परिणाम झालेला दिसत नाही.
गांजाची नर झाडे प्रामुख्याने उष्ण आणि कोरड्या वातावरणात वाढतात, तर मादी झाडे विशेषत: थंड आणि जास्त आर्द्रता असणाऱ्या वातावरणात वाढतात. पाश्चिमात्य देशांमध्ये संप्रेरकांचा उपयोग करून किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरून, उगवणाऱ्या बिया नर किंवा मादी झाडांमध्ये रूपांतरित केल्या जातात. पुरातत्वशास्त्राच्या नियमानुसार, स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचाच वापर कोणत्याही निर्माणकार्यात केला जातो. म्हणजेच त्या काळात वेरूळच्या परिसरात गांजाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. पावसाळ्यात बांधकामासाठी उपलब्ध असणारे मुबलक पाणी वापरून हा गिलावा केला जात असावा. पावसाळ्यातील मोठ्या प्रमाणात असलेली आर्द्रता आणि कमी तापमान असूनही एकही फळ किंवा बी मिळाले नाही, याचा अर्थ असा होतो की आपल्या पूर्वजांना झाडांमधील लिंगबदलाचे तंत्र माहित होते का?
बौद्ध धर्माच्या पंचशील सूत्रानुसार, सद्विवेक बुद्धीचा तोल ढासळविणारा कोणताही पदार्थ सेवन करणे वर्ज्य आहे. त्यामुळे तत्कालीन निर्माणकर्ते गांजाचे सेवनच करत नसावेत. याचा उपयोग या धाग्यासाठीच केला जात असावा, असेही म्हणता येईल.
असा हा गूढ गांजाचा आगळा वेगळा शोध.. अगदी विस्मयकारक ठरलेला !!
व्हारांडा आणि त्यामागे मंडप अशी जे २२ ची रचना आहे. मंडपाच्या मागच्या भिंतीत मधोमध असलेल्या देवकोष्टात लेण्यातील मुख्यमुर्ती म्हणजे बसलेला तीर्थंकर. या भिंतीच्या एका टोकाला सर्वानुभुती यक्ष आणि दुसर्या कडेला अंबिका यांच्या मुर्ती आहेत. मंडपाच्या भिंतीवर बसलेल्या तीर्थंकरांचे दोन पट्ट आहेत. यातील डाव्या भिंतीवरील शिल्पपटात पार्श्वनाथ, सर्वानुभुती यक्ष, यक्षी आणि भक्तगण दाखवले आहेत. मात्र इथे लेण्यातील सममिती (Symmetry ) जाणवत नाही.
जे २४ लेण्याचा तलविन्यास स्तंभमुखी व्हरांडा, त्यामागे तितक्याच रुंदीचा मंडप , त्यानंतर अंतराळ मागे गर्भगृह असा आहे.मंडप चार स्तंभावर असून बाजुच्या भिंतीत उपगर्भगृह आहेत. व्हरांडा आणि गर्भगृहामध्ये अंबिका, यक्षी , सर्वानुभुती यक्ष, पार्श्वनाथ, बाहुबली यांची शिल्प आहेत. भिंत्,गर्भगृह अशी मिळून तीर्थंकरांची २० शिल्प आहेत.
जे २३ या लेण्यात सुध्दा २२ तीर्थंकरांच्या मुर्ती आहेत. एकंदरीत वेरुळ येथील जैन लेण्यात वारंवार बसलेल्या व उभ्या राहीलेल्या तीर्थंकरांचे मुर्तीपट कोरलेले दिसतात.
जे २५ या लेण्याचा तलविन्यास विचारात घेतला तर बाकी रचना सारखीच असून फक्त मागील भिंतीत एका एवजी तीन गर्भगृह आहेत, इतकाच फरक आहे.
जगन्नाथसभेचा सभामंडप
नक्षीदार स्तंभ
पद्मासनस्थ महावीर आणि डावीकडे गोमटेश्वर
भिंतींवर कोरलेल्या महावीर मूर्ती व चवरी ढाळणारे गंधर्व ( मूर्तीच्या मस्तकावरील तिहेरी छत्राची संकल्पना बौद्ध कलेतून आली हे उघड आहे)
महावीर, गजारूढ मातंग यक्ष आणि गोमटेश्वर
सिद्धायिका आणि गोमटेश्वर
पार्श्वनाथ
गर्भगृहातील महावीर
जगनाथसभेतील भित्तीचित्रे
स्तंभ आणि छतांवरील नक्षी
कुठलासा एक प्रसंग
एका ठिकाणी बैलाचे चित्र रंगवलेले आहे.
नृत्याच्या प्रसंगाचे एक अप्रतिम चित्र
नर्तकांचेच अजून एक चित्र
काही अपवाद वगळल्यास या लेण्यांतील मूर्ती साचेबंद वाटतात. विशेषतः तीर्थंकरांच्या मूर्तींत विविधता नसून निर्जीवपणा जाणवतो. हे लेणे तसे लहानसेच असून एका बाजूला पार्श्वनाथ व दुसऱ्या बाजूला गोमटेश्वर अशा प्रतिमा आहेत. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृहात महावीरांची प्रतिमा आहे. हत्तीवर बसलेला मातंग यक्ष आणि सिद्धायिका देवीबरोबरच इथे जैन अनुयायी , आकाशगामी गंधर्व आणि साधेसेच पण नक्षीदार स्तंभ येथे कोरलेले आहेत. छतावर कमळफुलांची नक्षी आहे.
गर्भगृहातील महावीरांची मूर्ती
एकंदरीत जैन लेण्यांचे तलविन्यास, वास्तुशास्रीय वैशिष्ट्ये जसे स्तंभ, मुखभागावर कोरलेली शिल्प , छोटा कैलास लेण्याचे शिखर, इंद्रसभेच्या प्रांगणात असलेली शिखराची प्रतिकृती आणि मुर्तीकला याचा हिंदु लेण्याशी असलेले साधर्म्य बघता या लेण्यांचा काळ इ.स. नववे ते दहावे शतक असा सुचीत करतात. लेणे क्र. ३१ आणि पार्श्वनाथ टेकडीवर कोरलेल्या लेण्यावरुन या परिसरात लेण्यांची निर्मिती उत्तर चालुक्य काळापासून ते यादव काळापर्यंत सुरु राहीली याची साक्ष देतात.
वेरूळ जैन लेण्याप्रमाणेच अनेक प्राचीन जैन मंदिर/ठिकाणे पाहण्या सारखी आहेत.
१. सावरगाव,तुळजापूर जवळ - सुंदर नक्षीकाम.
२. हुमचा,कर्नाटक. - उत्कृष्ट कोरीवकाम [मिपा वर आधीच माहिती आली. दुवा शोधून टाकतो इथे.]
3. कसमलगी,कर्नाटक - भगवान पार्श्वनाथांची मूर्ती खड्गासनात आहे. या मुर्ती चा रंग दिवसाच्या प्रहरा प्रमाणे बदलतात.
४. सहस्त्रफणी पार्श्वनाथ मंदिर, विजापुर - मुर्तीवरील नागास १००० फणे आहेत. मुख्य फण्यावर पाणी / दुधाची धार धरल्यास, उर्वरित ९९९ फण्या मधून वितरीत होते. असा अभिषेक वर्षातून काही ठराविक दिवशी होतो.
५. हाळेबीडू / मूडबिद्री, कर्नाटक - येथे जैन तीर्थंकरांच्या, पाचू माणिक, मोती इ. रत्नांच्या स्फटीकांपासून बनविलेल्या अतिशय लहान व नाजूक प्रतिमा, अत्यंत सुंदर आणि टीपीकल कर्नाटकी जुन्या मंदिरात [त्याला बहुतेक 'बसदि' असा म्हणतात] ठेवल्या आहेत.
- अनय
Outside Cave 32, we heard a shrill, high-pitched sound and scanned the escarpment for the source. I mistook it for a bird and was surprised to discover that the sound was coming from a chipmunk several feet above us.
Nearby Cave 31 contains representations of jains or tirthankaras, liberated souls who have succeeded in ending the cycle of rebirth and teach others the path to enlightenment.
A Buddhist monk in front of the entrance to a shrine at Cave 32
Through a Jain lens

The standing meditation and omniscience of Bahubali, lower story, Cave 32, c. 9th century (Photo: Lisa N. Owen)
Ellora’s Jain caves provide more information in regard to patronage and the site’s internal development. Five Jain caves (Caves 30–34) are carved at the northern end of the site. The sculpted and painted programs feature Jinas, Jain deities (particularly associated with health, wealth, and abundance), and the Jain figure Bahubali. Reliefs of Bahubali at Ellora typically present the figure flanked by two females who are in the process of removing the vines that encircle his legs. Overhead are flying, celestial couples who hold long flower garlands to honor and worship Bahubali who has just attained omniscience due to his steadfast meditation. The forest setting of this event is referenced through the vines and the small deer that gather around his feet.
In addition to these subjects, the Jain caves are also carved with numerous human worshippers, both monastic and lay. [10] Typically they are carved in gestures of homage at the feet of a Jina. Some of these figures are identified through an inscription as the patron(s) of the sculpture, such as Nagavarma and Sohila in Cave 32. Their presence points to patterns of patronage at the site that go beyond royal elites. Moreover, it appears that scenes of human devotion made an impression on later imagery carved at the site, as seen in some additions to the Kailasanatha complex that feature portraits of anonymous devotees worshipping Shiva.
While the vast majority of Ellora’s Jain caves were carved in the ninth and tenth centuries, there is some evidence that Jain artistic activity was initiated much earlier. This can be seen in the pillar type carved in the upper-story veranda of Cave 33. These pillars, with their fluted, cushion-shaped capitals and tall, plain shafts, mirror those carved in some of the site’s early Shaiva and Buddhist caves. Also supporting an earlier date for the inception of Jain activity are three Jina images carved adjacent to Cave 33. The throne bases supporting these Jinas have a cloth or fabric that drapes down and covers the central section of the base. Carved above the cloth is a double-lotus seat that visually supports the Jina. These motifs are similarly found on the thrones supporting select Buddhas at the site. [11] These elements, among others, indicate a seventh or early eighth-century date for initial Jain activity. This is significant as it demonstrates that teams of artists were working on Hindu, Buddhist, and Jain caves simultaneously during this period.
The three Jina images adjacent to Cave 33 likely served as “placeholders” until artists could resume work on the Jain caves after the completion of the monolithic Kailasanatha temple in the mid-eighth century. As a result, we also have the innovative “Chhota (small) Kailasa” at Ellora (Cave 30)—a monolithic Jain temple that replicates the Kailasanatha in terms of its process of creation, directional orientation, and main architectural components, albeit on a smaller scale. [12]
Undoubtedly, future research will reveal more evidence for the movement of artists across the site and highlight ways that Ellora functioned as a multireligious tirtha in India’s early medieval period.

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)

















































































No comments:
Post a Comment