https://www.facebook.com/Amrutbhavsar7
सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा... काही स्थानिक महादेव कोळी लोकांच्या नुसार कौडण्य ऋषी यांनी या गडावर तपश्चर्या केली म्हणून या गडाच्या डोंगराचे नाव कोंढाणा असे पडले.
किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहि कडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इ.स. १६४७ मध्ये दादोजी कोंडदेवांचे निधन झाल्यावर कोंडाण्यावरील किल्लेदार सिद्दी अंबर याला लाच देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पुढे इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी तो परत आदिशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले, त्यामध्ये सिंहगड पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता हा मूळचा राजपूत होता पण तो बाटून मुसलमान झाला.
सिंहगड हा मुख्यत: प्रसिद्ध आहे, तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे, शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून सुटून परत आले, तेव्हा त्यांनी मोगलांना दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तानाजीने कोंढाणा आपण घेतो म्हणून कबूल केले.
या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो:
तानाजी मालूसरा म्हणून हजारी मावळियांचा होता. त्याने कबूल केले की, ‘कोंढाणा आपण घेतो’ , असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे, मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोहा बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले, चालोन आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार जाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरा सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे योद्धे, महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली दुसरी ढाल समयास आली नाही, मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूर्याजी मालुसरा (तानाजीचा भाऊ),याने हिंमत धरून, कुल लोक सावरून, उरले राजपुत मारिले, किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजाना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली. तेव्हा ते म्हणाले ,‘एक गड घेतला, परंतु एक गड गेला‘ माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री हे युद्ध झाले.
तानाजींच्या बलिदाना नंतर छ. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव "सिंहगड" ठेवले अशी आख्यायिका आहे. पण कोंढणा किल्ल्याचे सिंहगड हे नाव त्यापूर्वीच प्रचलित होते असे ऐतिहसिक कागदपत्रां वरुन सिध्द होते. खुद्द छ. शिवाजी महाराजींनी ०३/०४/१६६३ रोजी मोरो त्रिमळ पेशवे आणि राजश्री निळो सोनदेऊ मुजूमदार यांना लिहीलेल्या पत्रात," तुम्ही लष्करी लोकानसी व खासकेली हशमानसी कागद देखताच स्वार होवून किले सिंहगडास जाणे". असा सिंहगडाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
इ.स. १६८९ च्या मे महिन्यात मोगलांनी मोर्चे लावून हा गड घेतला. पण पुढे चार वर्षांनी १६९३ मध्ये विठोजी कारके आणि नावजी बलकवडे यांनी कोंडाणा परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. शनिवार दि २ मार्च इस १७०० या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावरती निधन झाले. पुढे इ.स. १७०३ च्या मे महिन्यात हा किल्ला परत मोगलांकडे गेला व स्वत: औरंगजेबाने हा किल्ला पाहून त्याचे नाव ’बक्षिंदाबक्ष’ (ईश्वराची देणगी) ठेवले. पुढे इ.स. १७०५ च्या जुलै महिन्यात हा गड मराठ्यांनी परत ताब्यात मिळवला. आणि भगवा पताका फडकावीला...
पुणे दरवाजा...

पुणे दरवाजा समोरचा दिंडी दरवाजा

पूर्वेकडील खांदकडा आणि त्यावरील बुरुज...

पश्चिम रांगेतील बुरुज...
कोंढाणा एक भक्कम प्रकारातील किल्ला. चारही बाजूनी प्रशस्त बुरुजांची फौजच जणू

दक्षिणाभिमुक बुरुज रांग...

टेहळणी जंगी मार्ग...

पुणे दरवाजा समोरचा दिंडी दरवाजा

पूर्वेकडील खांदकडा आणि त्यावरील बुरुज...

पश्चिम रांगेतील बुरुज...
कोंढाणा एक भक्कम प्रकारातील किल्ला. चारही बाजूनी प्रशस्त बुरुजांची फौजच जणू

दक्षिणाभिमुक बुरुज रांग...

टेहळणी जंगी मार्ग...
बुरुज रचना...
वाड्याचे द्वार अवशेष
वाड्याचे प्रवेशद्वार..
दगडी शिल्प
पश्चिम माची आणि बुरुज...
कल्याण दरवाजाकडे...
कल्याण दरवाजा....
कल्याण दरवाजातून दिसणारा दुहेरी बुरुज...
गडावरील जुने लोखंड दिसणे पण दुर्मिळच...
बलाढ्य कल्याण दरवाजा...
कल्याण दरवाजा जवळील बुरुज...
साद सह्याद्रीची...
देवडी..
दरवाजा वळवण्या साठी वापरण्यात आलेली दगडी बिजागीर
पूर्व माची...
कल्याण दरवाजा संरक्षण बुरुज रचना...
झुंझार बुरुज पायरी मार्ग...
याच बुरुजावर शेलार मामांनी कडवी झुंज दिली..
याच बुरुजावर शेलार मामांनी कडवी झुंज दिली..
जोड टाके
सुबक अशी दक्षिण तटबंदी...
बाललेकिल्ला वरील कातळ कोरीव पायऱ्या...
पिण्याचे पाणीचे टाके
देव टाकं
अमृतेश्वर मंदिर
नरवीर तानाजी मालुसरे यांची समाथी

अमृतेश्वर मंदिरातील कालभैरव आणि जोगेश्वरी यांची गुरु इच्छेने आरती करण्याचे भाग्य प्राप्त झाले.

शिल्प अवशेष...
या जागेवर तुंबळ युद्ध झाले...
अमृतेश्वर मंदिरातील कालभैरव आणि जोगेश्वरी यांची गुरु इच्छेने आरती करण्याचे भाग्य प्राप्त झाले.

शिल्प अवशेष...
हाच तो द्रोणागिरीचा कडा, जेथून तानाजी मालुसरे आणि मावळे वरती चढलेत.
तानाजी कडा...
मोकळ्या जागेत दिसणारे कोळीवाडा गाव... याच गावात तानाजीनी गोंधळ मांडला आणि तेथील लोकांना विश्वासात घेऊन कडा आणि गड सर केला.
घोड्याचा पागा
6 जून अगदी महत्वाचा आणि जवळचा दिवस...
शिवराज्याभिषेक दिन आणि आमच्या लग्नाचा 1 वर्षपूर्तीचा दिवस...
अशातच सह्याद्रीची चाहूल लागली मग मोहीम ठरली ऐतिहासिक आणि पौराणिक सहयाद्रीतील पंढरपूर अर्थात हरिश्चंद्रगडावर जाण्याची...
निघालो धडक द्यायला सोबत माझं प्रेम म्हणजे माझी बायको आणि दुसरं म्हणजे सहयाद्री आणि सोबत आमच्या बहीणाबाईंची साथ...
निसर्गाने आम्हाला या मंगल दिनी भेट म्हणून स्वर्गनुभव करून दिला.
स्वप्नपूर्ती म्हणून इंद्रव्रजचा अविष्कार डोळ्यांनी पाहण्याचे सुख ‘याची देही याची डोळा...’ अनुभवले.
कोकणकड्याची रौद्र पण शांत अशी भव्यता पुन्हा एकदा जाणवली.
तारामतीची ऊंची जणू अगदी ढगाच्या वरच नेऊन ठेवलेली.
साधारण 2000 वर्षांपूर्वीचा पश्चिम घाटातील सह्य पर्वत रांगेतील भौगोलिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड या किल्ल्याचा इतिहास हा ज्ञानेश्वर माऊलीच्या समकालीन घटनांची आठवण करून देणारा आहे, तर या परिसरातील भूगोल हा ऊन, पाऊस, वारा आणि थंडी यांचा सतत अनुभव देणारा आहे.
कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील हा किल्ला ६ व्या शतकातील आहे. ११ व्या शतकातील विविध लेणी कोरण्यात आल्या. संत चांगदेव 14 व्या शतकात येथे ध्यान करायचे. गुहा त्याच काळातल्या आहेत. गडावरील विविध बांधकामे आणि आजूबाजूच्या प्रदेशातील विस्तीर्ण संस्कृती अस्तित्त्वात असल्याचे दर्शविते. हरिश्चंद्रेश्वर मंदिरात आणि केदारेश्वरच्या गुहेत नागेश्वर मंदिरात आणि केदारेश्वरच्या गुहेत कोरीव काम दर्शवितात की हा किल्ला कोली महादेवाच्या कुलदेवतेच्या रूपात महादेवाशी संबंधित आहे. ते मोगलांच्या आधी किल्ल्यावर नियंत्रण ठेवत होते. नंतर किल्लावर मुगलांचे नियंत्रण होते आणि मराठ्यांनी ई.स. १७४७ मध्ये ताब्यात घेतला. किल्ला पौराणिक आणि फार पुरातन असून सूक्ष्म मनुष्याचे अवशेष येथे सापडले आहेत. मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंदपुराण यासारख्या अनेक पुराणात हरिश्चंद्रगडाचे अनेक संदर्भ आहेत.
सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत हरिश्चंद्रगड हा वेगळा आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे येथे तटबंदी नाहीत. परंतू या अजस्त्र डोंगरावर काही प्राचीन लेणी आहेत.तसेच शालिवाहन काळातील शिव मंदिर आहे.
रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र हे हरिश्चंद्रगडमधील तीन शिखरे आहेत.
तारामती या गडावरील सर्वोच्च शिखरावरून परिसरातील नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड पर्यंतचा निसर्ग पाहता येतो.
अशा प्रकारे मनमुराद हरिश्चंद्र गडावर स्वर्गनुभव घेतला आणि त्याने दिलाही
प्रारंभ...
गडाच्या दिशेने आगेकूच...
पाऊलोपावली कड्याबद्दल प्रेम वाढतच जाते
जंगलात शिरताना...
हरिश्चंद्रगड सहवास...
तारामती.... एक स्वर्ग वाट
"इंद्रव्रज" याचा योग येणे कठीणच...
भौगोलिक आणि वातावरणातील परिस्थिती जेव्हा एकरूप होते, त्याच वेळीयाचे दर्शन घडते.
सहयाद्रीने मुक्त हस्ताने दर्शन करून दिले
भौगोलिक आणि वातावरणातील परिस्थिती जेव्हा एकरूप होते, त्याच वेळीयाचे दर्शन घडते.
सहयाद्रीने मुक्त हस्ताने दर्शन करून दिले
"इंद्रव्रज" चा साक्षात्कार...
केदारेश्वर महादेवस्थान
इथल्या खांबांना एक विलक्षण अर्थ आहे असे म्हणतात. चार स्तंभ हे चार युगांचे प्रतीक आहेत, 'सत्ययुग', 'त्रेतायुग', 'द्वापर युग' आणि 'कलियुग '...
आता कलियुगाचा खांब तेवढा बाकी आहे.
इथल्या खांबांना एक विलक्षण अर्थ आहे असे म्हणतात. चार स्तंभ हे चार युगांचे प्रतीक आहेत, 'सत्ययुग', 'त्रेतायुग', 'द्वापर युग' आणि 'कलियुग '...
आता कलियुगाचा खांब तेवढा बाकी आहे.
महाविष्णू मंदिरायच्या बाहेरील सुबक दगड कोरीव गाभरा..
गडावर महादेव पूजनीय होते त्यामुळे बरेच ठिकाणी पिंडिंचे अस्तित्व बगायला मिळते
भग्न अवस्थेतील पिंड...
एकावर एक दगड उभेकरून भक्कम भिंत उभारताना खाचे प्रणालीचा केलेला उपयोग
दगडी मंदिर...
कातळ कोरीव पाण्याचे टाके
सध्याच्या घडीला गड पठरावर बरीच पडझड झालेली आहे. तरीही दिमाखात उभ्या असलेल्या वास्तू त्याकाळची भव्यता दर्शवतात.


सुबक कळस असलेले गणपती बाप्पा
कलाकृती आणि संस्कृतीचा एक नमुना...
चराचरात समावलेली सनातनता दगडावरची न पुसणारी रेघ असते, त्याच प्रकारे सुबकतेने उतरवलेली दिसून येते.
चराचरात समावलेली सनातनता दगडावरची न पुसणारी रेघ असते, त्याच प्रकारे सुबकतेने उतरवलेली दिसून येते.
महादेव मंदिराच्या बाजू कडील डोळे विसफारतील असे दगडी कोरीव बांधकाम...

पाचपिंडी महादेवासमोरील दगडी गाभाऱ्यात असणारे गणपती बाप्पा आणि महादेव...

राक्षस आणि किन्नर हे सुध्दा महाकाल यांचे पूजक होते. त्यांची प्रतिकृती शेंदूर लांबवलेल्या दगडावरून दिसून येते.

याठिकाणी खूप लोकं महादेवाची आराधना आणि पूजा करीत. गावाकऱ्याच्या मते गड ढासळल्यामुळे बराच मातीचा ढिगारा वाहून येतो त्यामुळे गडावर आजही उतखनन केल्यास बरेच महादेव पिंडीचे असतित्व दिसून येईल.

मंगळगंगेच्या प्रवाहात उठून दिसणारी सप्तर्षी पुष्करणी...

पाचपिंडी महादेवासमोरील दगडी गाभाऱ्यात असणारे गणपती बाप्पा आणि महादेव...

राक्षस आणि किन्नर हे सुध्दा महाकाल यांचे पूजक होते. त्यांची प्रतिकृती शेंदूर लांबवलेल्या दगडावरून दिसून येते.

याठिकाणी खूप लोकं महादेवाची आराधना आणि पूजा करीत. गावाकऱ्याच्या मते गड ढासळल्यामुळे बराच मातीचा ढिगारा वाहून येतो त्यामुळे गडावर आजही उतखनन केल्यास बरेच महादेव पिंडीचे असतित्व दिसून येईल.

मंगळगंगेच्या प्रवाहात उठून दिसणारी सप्तर्षी पुष्करणी...
कातळातील गणेश लेणी...
पिण्याच्या पाण्याचा स्रोत...
कातळ कोरीव गुहा...
आधुनिकतेला लाजवणारी त्यावेळची शिल्पकला...
खांब गुहा...
गुहेतील भव्य श्री महागणपती
गुहेच्या प्रत्येक खिडकीमधून हरिश्चंद्र मंदिराचे दर्शन बगायला मिळते.
चौथारा शिल्प...
मुक्काम उमरठ...
उमरठ हे स्वराज्याचे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे गाव.. तालुका पोलादपुर, जिल्हा रायगड. या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी आहे. सूर्याजी मालुसरे आणि त्यांच्या पत्नी यांची समाधी जवळील गावातच आहे. इतिहास वेड्यानी एकवेळ इथे जरूर जावे. हे लोक स्वराज्यासाठी अजरामर झाले. अशा स्वराज्याच्या शिलेदारांची समाधी स्थळे जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
माद्य नवमी 4 फेब्रुवारी 1670 रोजी "आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं" अशी प्रतिज्ञा करुन तानाजींनी कोंढाण्यावर चढाई केली आणि गड सर केला. पण या गडावर सुभेदार तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली. "गड आला पण सिंह गेला" असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊमासाहेबां सह उमरठ येथे उपस्थित राहून सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. रायबाचं लग्न लावले व स्वतःच्या हाताने नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी स्थापन केली. तानाजी मालुसरे यांचा देहांत कोंढाणा किल्ल्यावर झाला होता आणि तानाजी मालूसरे यांच्या मृत शरीराला त्यांच्या गावी म्हणजेच उमरठ येथे अग्नी देण्यात आला होता. त्यामुळे उमरठ येथे असलेली समाधी ही अग्नी समाधी आहे आणि कोंढाणावरील (सिंहगड) समाधी वीर तानाजी धारातीर्थी पडलेत त्या जागेवरील आहे. पुढच्या पिढीला बघायला ही समाधी स्थळे जिवंत रहिलीच पहिजेत. आपला इतिहास आणि शौर्यगाथा येणाऱ्या पिढ्याना परिस्तिथीशी लढायला बळ देतील. आणि तुमच्या सारखी इतिहास वेडी लोकं जर अश्या आपापल्या जवळ पास आसणाऱ्या सर्व योध्यांच्या समाधी स्थळाना भेट द्यायला लागलात तरच त्या समाधी स्थळांची सुधारना होईल अन्यता ही सर्व समाधि स्थळे नष्ट होतील. गड़किल्ले आणि समाधी स्थळे ही प्रेरणा स्थाने आहेत. ही नष्ट झालीत तर इतिहास नष्ट होईल. ज्या हस्तींमुळे स्वराज्य उभे आहे त्यांच्या स्मृती, इतिहास आपण हुन विसरलोत तर यांच्या वीरआत्म्यास दुःख होईल. इतिहास विसरलात तर परत इतिहास घड़नार कसा

वाड्याच्या आतील जागा... सद्य स्थितीला फक्त पाया शिल्लक आहे
उमरठ या ठिकाणी पोहोचताच एक वृद्ध दापत्य भेटले..
त्यांनी या ठिकाणा बद्दल बरेच काही सांगितलं. त्यातीलच हे एक शिवकालीन महाकाय आंब्याचे झाड. याचा घेरा कल्पनेच्या पण बाहेर आहे. आणि याच झाडाच्या ढोलीत धोप आणि दांडपट्टा यासारखी शस्त्र सापडली होती.
त्यांनी या ठिकाणा बद्दल बरेच काही सांगितलं. त्यातीलच हे एक शिवकालीन महाकाय आंब्याचे झाड. याचा घेरा कल्पनेच्या पण बाहेर आहे. आणि याच झाडाच्या ढोलीत धोप आणि दांडपट्टा यासारखी शस्त्र सापडली होती.
जीर्णवस्थेतील आपला शिवकार्य काळ पूर्ण:वश केलेल आम्रवृक्ष...
झाडामध्ये जवळ जवळ 5-6 लोकं उभे राहतील एवढी जागा आहे. त्याच मधे शस्त्र साठा सापडला होता.
नरवीर तानाजी याचे संवर्धित स्मारक
तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांचे समाधी स्थळ
उमरटठ स्थित प्रभू श्रीराम मंदिर
तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा
कळसुबाई....
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर...
पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पाच हजार फूटांवर तीन शिखरे आहेत. कळसूबाई (१६४६ मीटर), किल्ले ‘साल्हेर’ वर असलेले ‘परशुराम मंदिर’ चे शिखर (१५६७ मीटर) आणि मुडा (गावाळदेव) शिखर (१५३२ मीटर). त्यानंतर तोरणा किल्ला आणि इतर शिखरांचा क्रमांक लागतो.
हे शिखर आधी दोन वेळा सर केले होते ह्या वेळी भर उन्हाळ्यात विचार आला की चला ही एक मोहीम उन्हाळ्यात करून बघू.
या वेळी सोबत आमच्या बहिणाबाई होत्या. लागलीच रात्री बारी गावाजवळील पायथा गाठला आणि केली चढाईला सुरवात. गर्द अंधार वाट आणि चंद्र देवतेची साथ... असा प्रवास चालू केला. आरती (बहीण) न थकता अंधारातील वाट निडरपणे कापत चालत होती. मधे थोडा थांबून पोटपूजा केली आणि क्षणभर विश्रांती करून पुन्हा चढाई चालू ठेवली. या शिखराची ऊंची जरी खूप असली तरी गडकिल्ल्याच्या चढाई प्रमाणेच भासत नाही. कारण पायवाट मळलेली आणि बरेच ठिकाणी पायरीमार्ग आणि रेलिंग्स लावलेली असल्यामुळे सोपी झाली आहे.
पहाटे 4.30 ला उत्तुंग शिखरावर कळसुबाई देवीच्या मंदिराचे दर्शन झाले. सभोवतालचे वातावरण चंद्राच्या प्रकाशात बदल घेत होते. सहसा ढग वर असतात, पण या वेळी ते अगदी पायापासून खाली दिसू लागले अगदी डोळ्यांच्या नजरेच्या एकदम सरळ रेषेच्या ही खाली.
मंदिरात जाऊन पूजाअर्चा करून नमस्कार केला. आणि निसर्गाचा अत्युच्च आविष्कार पहिला. या निसर्गाच्या रूपात देवत्वाची प्रचिती आली, आम्ही तिथे नतमस्तक झालो.
शिखराच्या पूर्वेसविश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, हरिश्चंद्रगड लक्ष्य वेधून घेतात. शिखरावर प्राचीन पायरीचे आणि चौथाऱ्याचे अवशेष बगून या जागेची भव्यता किती असेल हे नक्कीच लक्षात येते. आजूबाजूच्या गडकिल्ल्यावरून कळसुबाई हे मंदिर नेहमीच केशरी रंगात चमकताना भासते आणि अनुभवले सुध्दा आहे. बरीचे लोकं नवस बोलून या जागी देवीचे दर्शनासाठी येतात. अश्याप्रकार चंद्र आणि सूर्य साक्षीला ठेऊन मोहिमेची सांगता झाली.
आपल्या महाराष्ट्रातील एव्हरेस्टला एकदातरी भेट द्या आणि महाराष्ट्राचे वैभव आणि निसर्गाची भव्यता अनुभवा...

निशब्द....
एक मावशी पायथ्याशी असणाऱ्या गावातून पाणी वर नेत होत्या ते ही न सांडता.
त्यांना विचारलं की वर एक बारा माही विहीर आहे, आणि अंतर पण जवळ मग त्यातील पाणी का नाही आणत तुम्ही?
त्याचे उत्तर मार्मिक होते.
चढाईच्या वेळी माणसाची नजर सरळ असते, balance राखला जातो पण उतरताना नजर खाली असते आणि आमच्या हंड्यांचा balance कसा जमणार....
त्याचा मुळे हा सगळा खटाटोप...
मनातून त्यांच्या जिद्दीला सलाम केला. त्याचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.
जमेल तस यांच्या कडून लिंबू सरबत किंवा काही घेत चला... तेवढाच त्याचा कष्टाला आणि रोजगाराला हाथभार लागत असतो
किल्ले सज्जनगड....
प्राचीन काळी या टेकडीवर ऋषी अश्वलयना वस्ती होती, म्हणूनच त्याचे नाव ‘अश्वलयंगड’. हा किल्ला शिलाहार राजा भोज यांनी अकराव्या शतकात बांधला होता. एप्रिल 2, 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहा पासून हा किल्ला जिंकला. समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांचा जीवन काळ जवळ पासचा आहे. समर्थांच्या प्रतीची आदर भावना आणि त्यांचा हिंदू संस्कृती बद्दलचा दैवीक प्रचार याला महाराजांनी नेहमीच नमन केले. समर्थांच्या वयानुसार त्यांना दगदग सहन करावी लागू नये म्हणून महाराजांनी सज्जनगड किल्ल्याची वेवस्थित डागडुजी करून,तो त्यांना कायमस्वरूपी राहण्यासाठी दिला.महाराजही अधूनमधून समर्थांकडे यायचे,काही काळ संभाजी महाराजही समर्थ आज्ञेने येथे राहिले होते. समर्थ रामदासांनी प्रमुख संत मंडळीना जमवून येथे रामाचा मोठा उत्सव केला व या किल्ल्याचे सज्जनगड असे ठेवले. स्वराज्याच्या अनेक काठीणप्रसंगी महाराजांना समर्थांचा सल्ला मोलाचा ठरला आहे.
समर्थांच्या निधनानंतर 1681 साली छत्रपती संभाजीराजे यांच्या आज्ञेवरून, रामचंद्र पंत अमात्य यांनी येथील राम मंदिराचा विस्तार केला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला औरंगजेबाने जिंकून रागाने त्याने येथील अनेक वास्तूंची नासधूस केली.
शाहू महाराजांचे राज्य सुरू झाल्यापासून हा किल्ला सतत मराठीशाहीतच होता. हा किल्ला सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगेत प्रतापगडाचा सोबती म्हणून वसलेला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या पावन वास्तव्याने या गडास सांस्कृतिक वारसा प्राप्त झाला आहे.
शके 1603 रोजी माघ नवमीला रामदासांनी समाधी घेतली, म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसून शिष्यांनी देऊळ बांधले आहे. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मुर्ती आहे. मुख्य मंदिरात राम-लक्ष्मण-सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत, जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. किल्ल्यावर श्री समर्थ मठ असून, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना दिलेला पलंग, भांडी, तसेच समर्थांची कुबडी, काठी, तसबीर इत्यादी वस्तू ठेवलेल्या आहेत. परिसरात समर्थानी स्थापित केलेली हनुमान व आंगलाई देवी यांची मंदिरे आहेत. गडावर अशोकवन, वेनाबाईवृंदावन, अक्कबाईवृंदावन,आणि समर्थमठ या वास्तू आहेत. समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी ज्या मोठ्या हंड्याने पाणी भरायचे तो हंडाही पाहायला मिळतो. समर्थांच मेरुस्वामीनी प्रत्यक्ष काढलेलं चित्रही येथे पाहायला मिळत.
स्वराज्य निर्मितीच्या काळात महाराजांना समर्थांच खूप सहाय्य झालं,
मराठा तितुका मेळवावा।महाराष्ट्र धर्म वाढवावा।।,
सामर्थ्य आहे चळवळीचे। जो,जो करील तयांचे।।,
केल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहिजे।।,
या आपल्या शिकवणीतून अनेक माणसं त्यांनी स्वराज्यकार्यास जोडली. अश्या थोर संतांच्या सानिध्याने पावन झालेल्या ह्या पावन भूमिस आयुष्यात एकदातरी भेट द्यावी, आणि तिथला जेवणाचा प्रसाद तोंडी लावून तृप्त व्हावे हेच आपले भाग्य. .
।।जय जय रघुवीर समर्थ।।
श्रीराम जय राम जय जय राम
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार...
प्रवेशद्वार क्रमांक 2
श्री समर्थ रामदास स्वामी महाद्वार
श्री समर्थ रामदास स्वामी महाद्वार
बुलंद अश्या समर्थ महाद्वारा कडील मधली बाजू...
दोन्ही बाजूला असलेली प्रशस्त सैनिक देवडी..
महाद्वारवरील पारसी शिलालेख :
मराठी अर्थ खालील प्रमाणे;
१) ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.
२) हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लीत करत आहे.
३) तू विंवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहे.
४) तुझ्या पासून सर्व विवंचना दूर होतात.
मराठी अर्थ खालील प्रमाणे;
१) ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.
२) हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लीत करत आहे.
३) तू विंवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहे.
४) तुझ्या पासून सर्व विवंचना दूर होतात.
किल्ल्यावर जाणारा राजमार्ग...
बुरुजचौकी...
दगडातील कोरीव शिल्प...
गडावरील ध्वज स्तंभ...
चुण्याचा घाना..
आजच्या घडीला लाजवेल अशी सुबक आणि एकसारखी बांधकामाची कलाकुसर...
पुरातन शिवलिंग, तुळशी वृंदावन, पादुका अवशेष..
रामदास स्वामींची बसण्याची जागा...
समर्थांना अंगापूरच्या डोहात सापडलेली अंगाई देवींची प्रतिमा आणि त्यानंतर समर्थांनी स्थापन केलेलं अंगाई देवी मंदिर..
गड स्थित धर्मध्वज
बुरुजाच्या तळातील बजरंगबली
भक्कम तटबंदी...
समर्थ रामदासांनी स्थापन केलेले धाब्याचा मारुती मंदिर...
भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती |
स्तोत्राचे जनक रामदासस्वामी यांनी धब्याच्या मारुतीची स्थापना केली.

ब्रम्हपिसा मंदिर...
स्तोत्राचे जनक रामदासस्वामी यांनी धब्याच्या मारुतीची स्थापना केली.

ब्रम्हपिसा मंदिर...
मोहिमे आधी स्वामींचा आशीर्वाद घेताना शिवाजी राजे
वरह मूर्ति समवेत...
उंब्रज मारुती 
शिराळे मारुती
पारगाव मारुती
मनपाडळे मारुती
बहे बोरगावं मारुती
शिंगणवाडी खडीचा मारुती
चाफळ दास मारुती
शहापूर मारुती
चाफळ प्रताप मारुती
माजगाव मारुती
मसूर मारुती

सोनाळे तलाव...

वीरगळ, शिवलिंग अवशेष
शिराळे मारुती
पारगाव मारुती
मनपाडळे मारुती
बहे बोरगावं मारुती
शिंगणवाडी खडीचा मारुती
चाफळ दास मारुती
शहापूर मारुती
चाफळ प्रताप मारुती
माजगाव मारुती
मसूर मारुती

सोनाळे तलाव...

वीरगळ, शिवलिंग अवशेष
पूर्व गडमाची..
कोयनेचे विस्तृत जलाशय
समर्थ रामदासांच्या वापरातील वस्तू...
कुबडी, लांब काठी, नाथांनी दिलेला लाकडी सोटा इ.
शिवाजी राजांनी त्यांना कुबडी भेट केली होती, त्यातच लपलेली तलवार असायची(गुप्ती).
कुबडी, लांब काठी, नाथांनी दिलेला लाकडी सोटा इ.
शिवाजी राजांनी त्यांना कुबडी भेट केली होती, त्यातच लपलेली तलवार असायची(गुप्ती).
3जिने आणि मारुती शिल्प असणारा तलाव
रामघळकडे जाणारा दगडी पायरी मार्ग
समर्थांचे ध्यानाचे ठिकाण... रामघळ
राजधानी सातारा 
स्वराज्याची मानाची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा उर्फ सप्तर्षीगड. पहिला #राजगड दुसरा #रायगड तिसरा #जिंजी तर चौथा #अजिंक्यतारा. किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शाहू महाराजांनी १७२१ मध्ये शाहूनगर बसवले मराठ्यांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राजधानी किल्ल्यावरून खाली नेली.
अजिंक्यतारा किल्ला ११९० मध्ये शिलाहार राजा पहिला भोज याने बांधला. बहामनी सत्तेच्या उदयानंतर हा किल्ला बहामनी सत्तेच्या अधिपत्याखाली आला. बाहामनी सत्तेच्या विभाजनानंतर आदिल शाही अंमल सुरु झाला. किश्वरखान या सरदारांने पहिल्या आदिलशहाची बेगम चांदबिबी हिला १५८२ मध्ये निजामशाहीशी संगणमत करत असल्याच्या संशयावरून किल्ल्यात कैद करून ठेवले परंतु किश्वर खानचा पाडाव झाल्याने त्याच वर्षी तिची सुटका झाली. दिलावरखान आदिलशाहीत कट-कारस्थान करत असल्याने त्याला १५९२ या किल्ल्यात कैद करून ठेवले होते. सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून केला जात असे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ जुलै १६७३ रोजी किल्ला स्वराज्यात आणला. त्याच दरम्यान महाराजांना अंगी ज्वर आल्याने या किल्ल्यात दोन महिने मुक्काम करावा लागला याच दरम्यान याठिकाणी रघुनाथ हणमंते त्यांच्याबरोबर कर्नाटक मोहीम व त्याचे नियोजन करण्यात आले.
शंभूराजेंच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने स्वराज्यातील आक्रमण तिव्र केले परंतु छत्रपती राजाराम महाराज व ताराराणी यांनी गडकोटांच्या मदतीने मोघलांना कडवी झुंज दिली.राजाराम महाराजांनी अजिंक्यतारा राजधानीचा किल्ला केला. बिथरलेल्या औरंगजेबाने गडकोट काबीज करण्याची मोहीम हाती घेतली त्याच अनुषंगाने त्याने वसंतगड जिंकून त्याचे नाव 'किली-दे- फतेह' अर्थात यशाची किल्ली असे ठेऊन फौजफाट्या सह सातारा किल्ला घेण्यासाठी चालून आला.
सातारा किल्ला राजधानी चा किल्ला असल्याने शिबंदी,रसद, दारुगोळा,व इतर साधनं सामग्री मोठ्या प्रमाणात होती. इ.स.१६९९ मध्ये मोघल सरदार तबियत खान ने मोर्चे बांधणी करून किल्याला वेढा दिला. किल्लेदार प्रयागजी प्रभू नी किल्ला तब्बल साडेचार महिने झुंजत ठेवला.किल्लावर मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा होत होता तरीही साडे चार महिने किल्ला तरी किल्ला हाती येत नसल्याने गडाची टेहळणी करून तोफांचा मारा तिव्र केला.
१३ एप्रिल १७०० रोजी मंगळाईच्या बुरुजा खाली सुरूंग लावून तो उडवून दिला.तटाची भिंत कोसळल्याने किल्ल्यावरील अनेक लोक कामी आले. या घटनेनंतर प्रयागजी प्रभूंनी मोगलांवर हल्ला करून बरेचसे मोगली सैन्य कापून काढले.
परशुरापंतानी यांनी रहुल्लाखानाच्या मध्यस्तीने मोगलांशी तहाची बोलणी करून २१ एप्रिल १७०० मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. मोगलांनी किल्ल्याचे नाव 'आझमतारा' असे केले
१७०६ मध्ये महाराणी ताराबाईंचे सरदार परशुराम त्र्यंबक यांनी किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव अजिंक्यतारा केले छत्रपती शाहूंनी मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर अजिंक्यतारा काबीज करून त्या ठिकाणी १७०८ मध्ये राज्याभिषेक करून घेतला मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार अजिंक्यतारा किल्ल्या वरून होता.१७१९ मध्ये महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर या ठिकाणी वास्तव्यास होत्या तसेच महाराणी ताराबाई १७३१ अखेर पर्यंत अजिंक्यतारा किल्ल्यावरच वास्तव्यास होत्या. सालापासून १८४९ पर्यंत किल्ला सातारच्या राजघराण्याच्या ताब्यात होता.
अंबारी सोबत हत्ती प्रवेश करेल असे भव्य महाद्वार.
त्यावर कोरीव शरब शिल्प आणि हनुमंतांची प्रतिकृती.
त्यावर कोरीव शरब शिल्प आणि हनुमंतांची प्रतिकृती.
सैनिक दिंडी आणि देवडी परिसर....
दगडात कोरलेला सुग्रीव युद्ध प्रसंग...
महाद्वार लगत असलेली शस्त्र ठेवण्याची जागा...
सुबक गड प्रवेश मार्ग..
उत्तरेकडील महाद्वार..
किल्ल्यास लाभलेली बुलंद तटबंदी...
गोमुखी महाद्वार आणि त्यावरील टेहळणी साठीची जागा ...
दगडी शौचकुप...
उत्तरमुखी बजरंगबली
पावसाळी तलावाशेजारील महादेव मंदिर...
महाकाय वृक्ष...
वाड्याचे अवशेष...
ताराराणीचा वाड्याचे अवशेष...
वाड्याच्या पायथ्याचे भव्य अवशेष त्या काळातील अस्तित्व दर्शवतात...
शिवप्रेमी
संस्था यांच्या कष्टा मुळे गडावर संवर्धन केले गेले आणि बरेच अवशेष आणि
त्यांचा इतिहास डोळ्या समोर ठान मांडून उभा राहिले आहेत.
दगडी पाया...
कोठार प्रवेशद्वार...
कोरीव हत्ती शिल्प..
रांजनाकृती भूमिगत कोठारे...
स्थापत्य कला...
अजिंक्यतारा किल्ला तुरुंग म्हणून वापरला गेला... त्याचाच एक नमुना.
हवेसाठी खिड्या आहेत पण गोमुखी आकाराच्या
हवेसाठी खिड्या आहेत पण गोमुखी आकाराच्या
चुण्याचा घाना...
महादेव
सात तलावतील एक तलाव...
बुलंद तटबंदी..
अगदी नावा सारखाच अजिंक्य आणि ताऱ्यांसारखाच चमकदार...
गड दैवत मंगळाई देवी
वीरगळ...
कोठार वास्तू ...
सुबक बांधकामचा उत्तम नमुना...
पावसाळी तलाव स्थित महादेव स्थान
सह्याद्री
प्रतिष्ठान या संस्थेकडून मोलाचे कार्य घडत आहे. कोणतीही सरकारी आर्थिक
मदत नसताना लोकं वर्गणीतून गडकोट यांना महाद्वार लोकार्पण करण्याचे
शिवकार्य ही संस्था करत आहेत.
आडमार्गाने भव्य दरवाजे, जड सामान खांद्यावर घेऊन वर पर्यंत नेले जाते. त्यांची जोडणी करून महाद्वार लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा केला जातो.
आडमार्गाने भव्य दरवाजे, जड सामान खांद्यावर घेऊन वर पर्यंत नेले जाते. त्यांची जोडणी करून महाद्वार लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा केला जातो.
दक्षिण दरवाजा मार्ग...
दक्षिण महाद्वार...
दक्षिण दरवाजा आणि देवडी..
दातेगड....
शिवरायांच्या पदस्पर्शने पावन... या गडाची सुंदरता पाहून शिवरायांनी या गडाला सुंदरगड नाव दिले होते.
पंधराव्या शतकात हा किल्ला शिर्क्यांच्या ताब्यात होता पण मलिक उत्तुजार ह्या सरदाराने शिर्क्यांचा पाडाव करून हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यावेळी वाढत असलेल्या बहामनी साम्राज्यात तो मिळवून दिला. पुढे बहामनी साम्राज्याचे ५ भाग पडले आणि ५ नव्या शाही उदयास आल्या (आदिलशाही,निजामशाही, कुतुबशाही,बरिदशाही, इमादशाही)…..त्यातील आदिलशाहीत पुढे हा किल्ला समाविष्ट झाला.इ.स.१५७२ पासून ह्या गडाची देशमुखी पाटणकरांकडे होती…..कोकणातून…. विजापूराकडून….येणाऱ्या फौजेवर लक्ष ठेवण्यास हे एक उत्तम टेहेळणी केंद्र होते. पुढे इ.स.१६५९ मध्ये अफजलखानाचा वध झाल्यावर…..आदिलशाहीमध्ये स्वराज्य आणि राजे यांच्याबद्दल बरीच मोठी भीती बसलेली दिसून येते…त्याच गोष्टीचा फायदा उठवत आपले मावळे सरसकट किल्ले जिंकत दक्षिणेकडे वळले होते त्याचवेळी दातेगड ही स्वराज्यात सामील झाला…..गडाची सुंदरता पाहूनच स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी दातेगडाचे नाव सुंदरगड असे ठेवले होते….ह्या गडाची जबाबदारी राजांनी सरदार साळुंखे यांच्यावर सोपवली पण हा पाटण भाग असल्याने साळुंखे हे देखील पुढे पाटणकर नावाने ओळखले जावू लागले….. इ.स.१६८९ मध्ये छत्रपती संभाजी राजांना सस्वर्गवास झाल्यावर हा गड मोघलांच्या ताब्यात गेला, पण लगेचच पाटणकर आणि संताजी घोरपडे ह्यांच्या पराक्रमाच्या जोरावर छत्रपती राजाराम महाराजांनी गड पुन्हा जिंकून घेतला…..राजाराम महाराजांच्या काळात इ.स.१६८९ ते १६९७ दरम्यान संताजी घोरपडे हे सरसेनापती होते.
या गडाचे वैशिष्ट असे की या ठिकाणी असलेली गेरुची विहीर तलवार वज्र विहीर. विहिरीत उतरताना शंभू महादेवाला नमन करून पुढे विहिरीत आत उतरले असता…खाली असणारी शांतता…..उंचचउंच तिन्ही बाजूने दिसणारी भिंत…..त्यावर पसरलेली हिरवीगार वेली…..असे ते मनमोहक दृश्य मनात साठवत आपण वरती आकाशाच्या दिशेने पाहिले असता……स्वतःच्या डोळ्यांवर लवकर विश्वास बसणार नाही असे एक मनमोहक दृष्य पाहायला मिळते…..ते म्हणजे वज्रमूठसहित तलवारीचे...
ऊंची: 575 
प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: बामणोली
सैनिक देवडी...
महादरवाजा पायरी मार्ग...
गडावर प्रवेश करताच मारुती रायांचे दर्शन होते.
महाद्वार आणि त्याचा बाजूला असलेली दगडी वास्तू रचना..
गड दैवत गणपतीचे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे असणारे कर्ण विशेष लक्ष वेधतात
7 फूट उंच आणि कातळात दिमाखानेc दर्शन देत उभे असलेली बजरंगबली
....
याठिकाणचे एक वैशिष्ट असं, की सूयोर्दय होत असताना सूर्यकिरण गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि सायंकाळी सूर्यास्त होत असताना सूर्यकिरण मारुतीरायावर येतात. अशा रचनेत खोदलेलं हे मंदिर पूर्व इतिहासातील शिल्प कलाकारांची बौद्धिकता जाणवून देतं.
याठिकाणचे एक वैशिष्ट असं, की सूयोर्दय होत असताना सूर्यकिरण गणपतीच्या मूर्तीवर पडतात आणि सायंकाळी सूर्यास्त होत असताना सूर्यकिरण मारुतीरायावर येतात. अशा रचनेत खोदलेलं हे मंदिर पूर्व इतिहासातील शिल्प कलाकारांची बौद्धिकता जाणवून देतं.
गडावर जाणारा सुबक पायरी मार्ग...
दरवाजाची कमान ढासाळली असली तरी ताठ मानेने इतिहासाची साक्ष देत उभा...
श्रेणी नुसार सैनिक देवडी...
तसलेले दगड आणि पेशवाई पासून चालत आलेली वीट बांधणी यांचा मिलाप करून उभारलेले भक्कम महाद्वार..
— at Dawadi.
— at Dawadi.
— at Dawadi.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव टिकून राहिले ते पिढ्यान् पिढ्या इथं नांदणाऱ्या मराठी घराण्यांमुळे. या घराण्यांमध्ये राजकारण, समाजकारण,धर्मकार्य अशा अनेक आघाड्यांवर आपला ठसा उमटवणारे पराक्रमी,धोरणी आणि विद्वान पुरुष जन्माला आले. महाराष्ट्राच्या खेडोपाडी आजही अशा घराण्यांची स्मृती जागविणारे जुने वाडे आणि गढ्या शिल्लक आहेत. त्यापैकी एक म्हणजे दावडी हे गाव ! या गावाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाहू काळात नावारुपाला आलेली दामाजी आणि पिलाजी गायकवाडांच्या पराक्रमाची साक्ष देणारी भक्कम गढी. श्रीमंत गायकवाड घराणे हे मुळचे पुणे शहराच्या लगतच असलेल्या मुळशी तालुक्यातील भरे या गावचे. या घराण्यातील मुळ पुरुष नंदाजीराव गायकवाड हे भरे गावात शेती करून राहत. शेतीवाडी करून आनंदाने राहणाऱ्या नंदाजीराव यांच्या नातवाचे म्हणजेच दमाजींचे मुलूखगिरी करून क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे विचार होते. पुढे दमाजी हे तळेगाव दाभाडे येथील सेनापति त्र्यंबकराव दाभाडे यांच्या सैन्यात शिपाईगिरी करु लागले. दमाजी हे अंगात असलेल्या शौर्यधैर्य गुणांमुळे लवकरच नावलौकिकास आले. त्यांचे पराक्रम, शौर्य व कर्तृत्व पाहून छत्रपति शाहुमहाराजांनी समशेरबहाद्दर हा किताब त्यांना दिला व स्वराज्याचा सहाय्यक सेनापति म्हणून अधिकार बहाल केला. पुढे बरीच पराक्रम दमाजींनी गाजवलेत. त्यांची पिढी द्वितीय दमाजी, सयाजी यांनी सुध्दा मोलाचे पराक्रम गाजवलेत. सध्या ही गढी कर्मवीर भाऊराव पाटील संस्थान अंतर्गत चालणाऱ्या एका शाळेच्या अधीपत्या खाली आहे. आजूबाजूला पसरलेले अवशेष बगता या गढीचा घेरा फार मोठा दिसून येतो. या गढीचा अभ्यास आणि माहिती समजून घेताना शाळेचे प्राचार्य श्री. केंगारे सर यांचे नक्कीच योगदान लाभले.












































































































































































































No comments:
Post a Comment