Tuesday, August 23, 2022

सफर कलिंग देशाची ( ओडिशा प्रवासवर्णन) ( भाग १)

     ओरिसा भारत देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओड़िशा भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या उत्तरेला आहे.ओडिशा या राज्याला पूर्वी ओरिसा या नावाने देखील ओळखले जात होते. कलिंग,हे त्याच प्राचीन राष्ट्राचे नाव होते, ज्यावर मौर्य सम्राट अशोकाने इ.स.पूर्व २६१ मध्ये आक्रमण केले होते आणि युद्धातील भयंकर रक्तपातामुळे व्यथित होऊन शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला होता. उ. अ. १७ ̊ ४८’ ते २२ ̊ ३४’ आणि पूर्व रे. ८१ ̊ ४२’ ते ८७ ̊ २९’. क्षेत्रफळ १, ५५, ७८२ चौ. किमी. 
odisha information in marathi


Odisha Information In Marathi

   Odisha Information In Marathi

        देशाच्या ईशान्य भागात स्थित, हे उत्तर आणि ईशान्येकडील झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यांनी, पूर्वेला बंगालच्या उपसागरासह आणि दक्षिणेस आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांनी आणि छत्तीसगढला जोडलेले आहे. इ. स १९४७ मध्ये भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ओडिशाची राजधानी कटक येथे होती. सध्याचे राजधानी नंतर भुवनेश्वर येथे पूर्व मध्य किनारपट्टीच्या मैदानावरील शहराच्या ऐतिहासिक मंदिरांच्या परिसरात बांधण्यात आली.भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर आणि कटक ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे.
हे राज्य प्रामुख्याने ग्रामीण आहे पण औद्योगिकीकरणाने त्याचा चेहरामोहरा बदलत आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
      ओड़िशाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओड़िशा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa.ओरिया, हिंदी आणि इंग्रजी या मुख्य भाषा आहेत जे ओरिसामध्ये बोलल्या जातात.
   ओडिशा राज्यात विविध देवतांची मंदिरे आणि अभयारण्ये समुद्रकिनारे आणि धबधबे , गरम पाण्याचे झरे आणि वन्यजीव सृष्टी लाभलेली आहे. ओडिसातील जगन्नाथ आणि कोणार्क सूर्य मंदिरे पुरीमधील भक्तांच्या श्रद्धेची मुख्य केंद्रे आहेत.  समृद्ध परंपरा आणि नैसर्गिक संपत्ती असलेला ओरिसा आपल्या सुंदर पर्यटन स्थळांसाठीही जगात खूप प्रसिद्ध आहे. ओडिशा राज्यात 30 जिल्हे आहेत.  चला मग पाहूया या राज्य विषयी माहिती.
राज्य ओडिसा
राजधानी भुवनेश्वर
स्थापना दिवस   १ एप्रिल 1936
राज्यपाल प्रो. गणेशी लाल
मुख्यमंत्री नवीन पटनायक
उच्च न्यायालय कटक
क्षेत्रफळ 1,55,707 वर्ग किमी.
लोकसंख्या 4,19,74,218
लोकसभाच्या जागा 21
राज्यसभेच्या जागा 10
विधानसभेच्या जागा   147
जिल्हे 30
तालुके 317
राज्य फुल    बुरांश
राज्य पक्षी हिमालयी मोनाल
राज्य पशु सांबर
राज्य वृक्ष बुरंश
पहिले मुख्यमंत्री कृष्ण चंद्र गजपति (1 अप्रैल 1937)
भाषा:-    उड़िया, मागधी
लोकनृत्य ओडिसी
नदियाँ महानदी
जनजाती- जुआंग, खरिया, भुइया, संथाल, हो, कोल, गोंड, सोंड, चेंचू
ओडिशा मधील तीस जिल्हे- 
भुवनेश्वर, कटक, पुरी, देवगढ़, मयूरभंज, भद्रक, गजपति, सोनपुर, बालासोर, जाजपुर, कालाहांडी, खुर्दा, अनुगुल, बोलांगिर, बौध, बरगड़, ढेंकनाल, जगतसिंहपुर, झारसुगुड़ा, नयागढ़, सुंदरगढ़, रायगड़ा, केंद्रपाड़ा, कोरापुट, मलकानगिरि, गंजम, संबलपुर, कंधमाल, नवरंगपुर
Orissa-Logo-new.jpg

ओडीशा राज्य इतिहास :

पुराणांतून उत्कल म्हणून ओरिसाचा निर्देश प्राचीन काळापासून झाला आहे. सुवर्णरेखा नदीपासून ऋषिकूल्येपर्यंत आणि मेकल राज्यासून कपिशेपर्यंत असा त्याच्या सीमांचा उल्लेख आहे. सुद्युम्‍नपुत्र उत्कल याने स्थापन केले म्हणून त्याचे नाव मिळाले. मेकल, आंध्र, उद्र व कलिंग  यांच्याबरोबरच उत्कल देशाचे नाव येते. कलिंग म्हणूनही या प्रदेशाचे प्राचीन नाव आहे. याचे स्थान आर्यावर्ताच्या पूर्वेस, वैतरणीचे तीरावर, आंध्रच्या उत्तरेस असे वर्णिलेले आहे. वेळोवेळी याच्या वेगवेगळ्या सीमांचे उल्लेख आहेत. ऋग्वेदात उल्लेख आलेल्या कक्षीवान ऋषी हा कलिंग देशाच्या राणीच्या दासीचा पुत्र होता.  महाभारतात कलिंगाचे स्थान आर्यावर्ताच्या पूर्वेस असल्याचे सांगितले आहे. महाभारतातील  अर्जुन कलिंगच्या तीर्थयात्रेला गेला होता.  कर्णाने व कृष्णाने या प्रदेशावर स्वारी केली होती. परशुरामानेही  कलिंग जिंकला होता. इतिहासावरून असे दिसते की मौर्य साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी हे एक प्रबळ राज्य होते.पुरी ते गंगानदी या सीमा कामसूत्रात सांगितल्या आहेत. कलिंगाचा उल्लेख नेहमी अंग व वंग देशांबरोबर झालेला आढळतो. वायुपुराणात कृतयुगातील पहिला मानव या भूमीवर झाला असे म्हटले आहे. कर्मपुराणात गंगा ते गोदावरी व अमरकंटक ते सागरतट या प्रदेशांत कोसल, उद्र, उत्कल व कलिंग ही मोठी राज्ये असल्याचे वर्णन आहे. महाभारतात कलिंगाचा मार्ग गंगामुखाच्या दक्षिणेस ताम्रलिप्ती, कर्वाट, सुह्म व वैतरणीवरून जातो असे सांगितले आहे.

 दिधनिकाय, जातककथासारख्या बौद्ध साहित्यात कलिंग देशाचे अनेक निर्देश आहेत. खि. पू. चौथ्या शतकात कलिंगातील जैनधर्मीय राजांचा मगधाच्या नंदांनी पराभव केला, पण नंदांचा नि:पात करून चंद्रगुप्त मौर्य राज्यावर आला, तेव्हा कलिंग स्वतंत्र झाला.चंद्रगुप्तचा नातू अशोक याने मोठे युद्ध करून कलिंग देश जिंकला, तेव्हाच्या संहारानेच त्याला उपरती होऊन तो अहिंसावादी बौद्ध धर्माचा उपासक बनला.

 सम्राट अशोकाने धुळी येथे कोरलेला खडक स्तंभ बसवला आणि तो फक्त ५ किमी अंतरावर आहे. सध्याच्या राजधानी भुवनेश्वरजवळ हा स्तंभ जवळजवळ २३ शतकांपासून उभा आहे आणि तेथे कोरलेले शिलालेख बौद्ध तत्त्वांचा संदेश देतात. 
अशोकांनंतर कलिंग देश पुन्हा स्वतंत्र झाला. ख्रि. पू. दुसऱ्या शतकात चेदी वंशाचा तिसरा राजा खारवेल हा या प्रदेशाचा विख्यात नृपती होऊन गेला. त्याने कन्याकुमारी पासून गंगेपर्यंत आणि पश्चिमेस महाराष्ट्रापर्यंत दिग्विजय केला. नंदांनी  पूर्वी  नेलेली कलिंगजिनाची मूर्ती मगध जिंकून परत आणली आणि भुवनेश्वरजवळचे उदयगिरी-खंडगिरी क्षेत्र जैन धर्माचे श्रद्धाकेंद्र बनवले. तेथील हाथीगुंफेत खारवेलाच्या कारकीर्दीचा वृत्तांत कोरलेला आहे. तथापि याची तेजस्वी राजवट अल्पकाळच टिकली व त्यामागून चेदी वंशाला पडता काळ आला. त्यानंतर कित्येक शतकांपर्यंतचा कलिंगाचा इतिहास अस्पष्ट आहे. तथापि उपलब्ध साधनांवरून दिसून येते की, इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांत उत्कल प्रदेशाच्या किनाऱ्याला भरभराटीत असलेली कित्येक बंदरे होती व त्यांतून यवद्वीप, सुमात्रा, बाली व आग्नेय आशियातील अन्य स्थळांकडे योद्धे, व्यापारी, धर्मप्रसारक व इतर लोक यांची रीघ लागली होती. त्या लोकांनी स्थापन केलेल्या वसाहतींची कालांतराने प्रबळ राज्ये झाली. प्रत्यक्ष कलिंग देश सागरी व्यापारावर संपन्न पण अनेक छोट्या राज्यांत विभाजित झाला होता. बौद्ध धर्माची पुन्हा चलती होती. 

चौथ्या शतकात दक्षिण दिग्विजयास निघालेल्या सम्राट समुद्रगुप्ताच्या मार्गात आलेल्या उत्कल प्रदेशातील पाच राजांचा प्रतिकार त्याने मोडून काढल्याचा इतिहासात उल्लेख आहे.सातव्या शतकात कलिंग हर्षवर्धनाच्या राज्यात आला व तेथे महायान बौद्धमताच्या प्रचाराचा प्रयत्न झाला. त्याच्या कारकीर्दीत ६३८मध्ये ह्युएनत्संग हा चिनी यात्रेकरू कलिंगात आला होता. त्याने नमूद केले आहे की, येथील लोकांची भाषा व चालीरीती मध्य भारतातील लोकांहून वेगळ्या असून, हे लोक उंच व सावळ्या वर्णाचे आहेत. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात ओरिसात सोमवंशीय महाभावगुप्त जनमेजयाने (६८०—७१२) नवे प्रबळ राज्य स्थापन करून कटकपर्यंत सीमाविस्तार केला. त्याच्या मागून महाशिवगुप्त, ययाती नावाचे दोन राजे पाठोपाठ गादीवर आले. त्यांतील दुसऱ्याने उत्कल देशाच्या इतिहासातील विख्यात केसरी कुलाची राजवट सुरू केली (७९५). कलिंग, कंगोड, कोसल व उत्कल ही राज्ये एकत्रित करून खारवेलाची साम्राज्यपरंपरा त्याने पुनरुज्जीवित केली. वैदिक धर्माचा उत्साहाने पुरस्कार करून त्याने कान्यकुब्जाहून दहा हजार विद्वान ब्राह्मण ओरिसात वसवले असे सांगण्यात येते. पुरीला पहिले जगन्नाथमंदिर त्यानेच बांधले असे मानतात. त्याचा मुलगा उद्योतकेसरी दुसरा महाभावगुप्त हाही खंबीर राज्यकर्ता व धर्माभिमानी होता. त्याचा कल शैव मताकडे असून भुवनेश्वर येथील बरीच मंदिरे त्याच्या कारकीर्दीत उभी राहिली. अकराव्या शतकात पूर्वेच्या गंग वंशाचा राजा तिसरा वज्रहस्त याने त्रिकलिंगाधिपती ही पदवी धारण करून तीस वर्षे कलिंगाचे वैभवसंपन्न राज्य भोगले. त्याचा नातू अनंतवर्मन् चोडगंग याने अकराव्या शतकाअखेरच्या काळात पुरीच्या जगन्नाथमंदिराचे शिखर व सभामंडप बांधल्याचा समज आहे. गंग राजे वैष्णव मताचे अभिमानी होते. त्यांच्यापैकी पहिला अनंगभीम, दुसरा राजराज, दुसरा अनंगभीम व कोणार्कचे प्रसिद्ध सूर्यमंदिर बांधणारा पहिला नरसिंहदेव यांनी विशेष कीर्ती मिळविली. तेराव्या शतकाअखेरीपासून ओरिसाला मुस्लिमांचा उपद्रव जाणवू लागला. बंगालच्या सुलतानांची धाड १३५२ मध्ये येऊन गेली. तीनच वर्षांनी दक्षिणेच्या प्रबळ विजयानगरच्या सेनापतीने गंगाराज भानुदेवीचा पराभव करून ओरिसा राज्य खिळखिळे केले. १३६१ मध्ये फिरोजशाह तुघलकाने स्वारी करून लूट केली अनेक देवळे नष्ट केली व कटक येथे भानुदेवास शरणागती पतकरण्यास भाग पाडले. १४३१ मध्ये दुबळ्या गंग वंशाला बाजूला सारून सूर्यवंशी कपिलेंद्रदेवाने सत्ता बळकावली व गजपती राजवट सुरु केली. त्याने प्रथम ओरिसातील अंतर्गत बंडे मोडून काढली नंतर बंगालच्या सुलतानाचा समाचार घेतला बहामनी सैन्याचा पराभव केला आणि विजयानगरचाही  बराच प्रदेश जिंकून घेतला. १४६४ मध्ये त्याच्या राज्याची सागरसीमा गंगेच्या मुखापासून कावेरीच्या मुखापर्यंंत होती. तथापि कपिलेंद्रदेवामागून गजपती वंशाची सत्ता क्षीण होत गेली. उत्तरेकडल्या आक्रमकांबरोबर व गोवळकोंड्याच्या सुलतानाशी झगडे चालूच राहिले. तशात घरच्या कलहांनी आणि विश्वासघातांनी राज्य पोखरले आणि अखेर १५६८ मध्ये बंगालचा सुलतान सुलेमानखान याचा सेनापती काला पहाड याच्याशी झालेल्या लढाईत ओरिसाचा शेवटचा राजा मुकुंददेव पडला. तेव्हापासून बंगालच्या अफगाण सुलतानाकडे असलेला हा प्रांत १५९२ मध्ये अकबराचा सेनापती मानसिंग याने जिंकून मोगल साम्राज्याला जोडला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्य बादशाहला न जुमानता स्वतंत्र असल्यासारखे वागणारे बंगालचे नबाब ओरिसाचे सत्ताधारी होते. १७५१ मध्ये हा सुभा अलीवर्दीखानाने नागपूरच्या भोसल्यांना दिला. मग ओरिसावरचा पन्नास वर्षांवरील मराठ्यांचा अंमल संपुष्टात आणून १८०३ मध्ये ब्रिटिशांनी हा मुलूख घेतला. सुरुवातीस तो कटक जिल्हा म्हणून एका मुलकी अंमलदाराकडे होता व अनेक छोट्या छोट्या संस्थानांशी ईस्ट इंडिया कंपनीचे स्वतंत्र तहनामे झाले होते. ओरिसा त्यांच्यासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा नसल्याने त्यांनी तेथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फार कमी प्रयत्न केले.१८२८ मध्ये कटक, बलसोर व पुरी हे जिल्हे व खंडणी देणारी संस्थाने मिळून एक उपप्रांत म्हणून ओरिसा बिहारला जोडण्यात आला.१९०५ मध्ये त्यात संबळपूर जिल्ह्याची भर पडली. १९३६ मध्ये ओरिसा वेगळा प्रांत झाला. बिहारपासून विभक्त व सर्व ओडिया भाषिकांच्या एकत्रित अशा प्रांतासाठी १९०३ पासूनच देशभक्त मधुसूदन दास यांच्या नेतृत्वाने उत्कल युनियन कॉन्फरन्सची चळवळ सुरू झाली होती. नंतर महात्मा गांधींच्या अहिंसात्मक असहकाराच्या आंदोलनात ओरिसा काँग्रेस हिरिरीने सहभागी झाली. १९३०च्या मीठ सत्याग्रहात गोपबंधू दास, मेहताब, रमादेवी, मालतीदेवी, सरलादेवी इत्यादींनी यशस्वी नेतृत्व केले. १९३७ मध्ये श्री. विश्वनाथ दास यांचे पहिले काँग्रेस सरकार अधिकारारूढ झाले पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेसपक्षाने सत्तात्याग केला. कदाचित तुम्हाला माहित नसेल की दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरने ओडिशा काबीज करण्याची योजना आखली होती कारण हिटलरचा असा विश्वास होता की ओडिशामध्ये भरपूर नैसर्गिक पदार्थ आहेत ज्याच्या सहाय्याने तो कोणतेही युद्ध जिंकू शकतो, परंतु हिटलरचे हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले.१९४२च्या स्वातंत्र्य आंदोलनात ओरिसात हजारो देशभक्तांनी चौफेर उठाव केला लक्ष्मण नायको यास फाशी देण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ओरिसा, मध्य प्रदेश व बिहारमधील एकूण २६ संस्थाने विलीन झाली. १९४९ पासून संपूर्णपणे ओडियाभाषी ओरिसाने संघराज्यात आपले योग्य स्थान मिळविले.

ओडिशा राज्याची स्थापना

आधुनिक ओडिशा राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी कटक येथील कनिका पॅलेस येथे झाली .राज्याची स्थापना राज्य म्हणून झाली आणि या नवीन राज्यातील बहुतेक नागरिक ओडिया भाषिक होते. राज्यात १ एप्रिल हा उत्कल दिवस (ओडिशा दिवस) म्हणून साजरा केला जातो.







 हवामान
              कर्कवृत्ताच्या दक्षिणेस एकच अंशावर उत्तरसीमा असणारे हे राज्य उष्ण कटिबंधात अतएव स्वाभाविकतः उष्ण वायुमानचे आहे. वातावरणाच्या कमी दाबाच्या पट्ट्यात येत असल्याने येथील पर्जन्यप्रमाण मध्यम आहे वेगवेगळ्या भागांच्या उंचसखलपणामुळे त्यांत थोडेबहुत फेरफार होतात.
        उन्हाळ्यात पूर्वेकडील टेकड्या व उत्तरेकडचे पठार यांच्या उंचीवरची ठिकाणे वगळता सर्वत्र सामान्य तपमान ३८° से. असते व किनाऱ्याकडून अंतर्भागाकडे ते वाढत जाते. थंडीच्या दिवसात सरासरी तपमान २२·८० ते १५० से. पर्यंत उतरते. पावसाळ्यात सरासरी वार्षिक १४८ सेंमी. पाऊस पडतो.

                 अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्हींवरचे मान्सून प्रवाह या राज्यात एकत्र येतात. नैर्ऋत्य मान्सूनचे काळात बंगालच्या उपसागरावरून किनाऱ्यावर पुष्कळदा तुफाने येतात. याच सुमारास ईशान्य मान्सूनचे काही झोत पूर्वेकडच्या टेकड्यांवर येतात. राज्यात झालेल्या १९७१च्या तुफानाने फार नुकसान झाले.

भूवर्णन

 राज्याचे सामान्यत: चार नैसर्गिक विभाग पडतात.
 (अ) उत्तरेचे पठार : यात मयूरभंज, केओंझार व सुंदरगढ हे जिल्हे आणि धेनकानाल जिल्ह्याचा पाल्लहरा तालुका हा उंचसखल प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे उतरत येतो. हा बिहारच्या छोटा नागपूर पठाराचाच दक्षिण भाग असून त्याच्या टेकड्यांवर पडणारा पाऊस असंख्य प्रवाहांनी नद्यांना जाऊन मिळतो. या पठाराचा सरासरी ९३० मी. उंचीचा मध्यभाग, वैतरणी व ब्राह्मणी नद्यांमधील सर्वांत महत्त्वाचा जलविभाजक आहे. त्याच्या उत्तर व पूर्व भागांत अनेक टेकड्यांच्या रांगा असून त्यांत मलयगिरी, मानकर्णाच, मेघसानी अशी १,१०० ते १,२०० मी. उंचीची शिखरे आहेत. 
(आ) मध्यवर्ती  नदीखोऱ्यांचा विभाग : हा उत्तरेचे पठार व पूर्वेच्या टेकड्या यांच्या दरम्यान येतो. यात राज्यातल्या मुख्य नद्यांची जलवाहन क्षेत्रे असून त्यांत बोलानगीर, संबळपूर व धेनकानाल जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागात जमिनी सुपीक आहेत. सपाट मैदानांतून मधूनमधून उभ्या टेकड्या आढळतात. राज्याच्या वायव्य भागातले महानदीतले खोरे बरेच विस्तृत आहे. मध्य विभागातली महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या नद्यांची खोरी समांतर, कृषिसंपन्न व दाट वस्तीची आहेत. 
(इ) पूर्वेकडच्या टेकड्यांचा भाग :  हा भाग म्हणजे भारतीय पूर्वघाटाच्या शेवटच्या रांगा आहेत. मध्यभागातील नदीखोऱ्यांच्या दक्षिणेस व नैर्ऋत्येस सु. २५० किमी., ईशान्य नैर्ऋत्य रोखाने या पसरल्या असून त्या कोरापुट, कालाहंडी, बौध खोंडमाल्स व गंजाम जिल्ह्यांतून जातात. त्यांच्यामधील प्रशस्त खुल्या पठारांभोवती वनप्रदेश व राज्यातली सर्वोच्च शिखरे– देवमाली १,६७० मी., तुरिआ कोंडा १,५९८ मी. व महेंद्रगिरी १,५०० मी. आहेत. या गिरिप्रदेशाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून ९३० मी. असून तो बहुमोल वृक्षांच्या दाट रायांनी व्यापलेला आहे. यावर पडणारा पाऊस दोन बाजूंना वाहून ऋषिकूल्या, नागावली व वंशधारा नद्यांतून थेट बंगालच्या उपसागरात आणि उपनद्यांतून गोदावरी व महानदी या नद्यांकडे जातो.
 (ई) किनारी सपाटीचा प्रदेश : यात बलसोर, कटक व पुरी जिल्हे आणि गंजाम जिल्ह्याचा काही भाग येतो. पश्चिमेकडील डोंगराळ भाग आणि पूर्वेकडील खारपट्ट्या यांच्या दरम्यान हा नदीगाळाचा विस्तृत पट्टा आहे. बंगालच्या उपसागराला अगदी लागून असलेल्या भूप्रदेशात अनेक मंदवाही आणि समुद्राच्या भरती-ओहोटीनुसार कमीजास्त मचूळ होणारे प्रवाह  आहेत. बलसोर व पुरी जिल्ह्यांतला यांचा भाग रेताड आणि कटक जिल्ह्यात दलदलीचा आहे. या किनारपट्टीमागची प्रशस्त गाळजमीन मात्र अनेक नद्यानाल्यांनी भिजून भरपुर भातपीक देते.
    राज्याच्या उत्तरेच्या पठारभागाची माती लाल आहे. इकडे ग्रॅनाइट खडक जास्त असल्याने त्याची रेती मातीत असते. या भागात पाणी धरून ठेवणाऱ्या चिकणमातीचेही काही प्रमाण जमिनीत आहे. मध्यपठारावरच्या मृदा विविध प्रकारांच्या आहेत. खडकापासून बनलेली माती, वाऱ्या-पावसाने वाहून आणलेली धूळ आणि गंजाम जिल्ह्याच्या ईशान्येतील व महानदीच्या दोन्ही काठांची कपाशीची काळी माती. आणखीही वेगवेगळ्या जातींच्या मृदा मध्यपठारावर सापडतात. किनाराभागात दुमट माती आहे. ओरिसाच्या मृदांची संपूर्ण पाहणी अजून झालेली नाही. 

वने व प्राणी

राज्याचा ४२ प्रतिशत, मुख्यत: पश्चिमेकडचा भूप्रदेश वनाच्छादित आहे. ओडिशा राज्यात साल, साग, शिसवी, पिआसाल, कुरूम, चाफा व गंभर या जातींचे वृक्ष आहेत. इमारती व इतर बहुमोल लाकडांखेरीज बाकीचा लाकुडफाटा जळणाच्या कामी येतो. बांबूची बेटेही विस्तीर्ण क्षेत्रांवर आहेत. त्यांचा विनियोग कागद-गिरण्या करतात.
    बिड्या वळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या तेंदूच्या पानांचे उत्पादनही बऱ्याच प्रमाणात होते. ओरिसाच्या जंगलातून सर्पगंधासारख्या कित्येक औषधी वनस्पती आणि थोड्याफार प्रमाणात मध व लाख जमा करण्यात येते.








    वन्यप्राण्यांपैकी या राज्यात वाघ, हत्ती व   विपुल आहेत. वायव्यभागात काही रानरेड्यांचे कळप आहेत. महानदी  व ब्राह्मणी नद्यांच्या मुखाशी सुसरी आढळतात. चिल्का सरोवरात पाणबदके व स्थलांतर करणाऱ्या काही पक्ष्यांच्या जाती आढळतात.
   मयूरभंज जिल्ह्यात वन्यपशुसंरक्षणार्थ १,०४० चौ. किमी. क्षेत्राचे सिमिलीपाईगिरी अभयारण्य आहे. तशीच संरक्षित क्षेत्रे चंडका व खंडगिरी येथे करण्याची योजना आहे. कालाहंडी व कोरापुट जिल्ह्यांतील काही वनप्रदेश १९५८ साली सुरू झालेल्या दंडकारण्य निर्वासित-पुनर्वसन योजनेत गेला आहे.

खनिज संपत्ती :

  राज्यात लोहधातुकाचे प्रचंड साठे आहेत. ६० प्रतिशतपेक्षा अधिक लोहांश देणारे कच्चे खनिज विशेषत: सुंदरगढ, केओंझार व मयूरभंज जिल्ह्यांत सापडते. कटक जिल्ह्यातही नवे साठे मिळाले आहेत. भारतातले २० प्रतिशत मँगॅनीज केओंझार, सुंदरगढ, बोलानगीर व कालाहंडी जिल्ह्यांत निघते. केओंझार, धेनकानाल व कटक जिल्ह्यांत क्रोमाइट उपलब्ध आहे. धेनकानालच्या तालचेर तालुक्यात भरपूर कोळसा मिळतो. गंजाम जिल्ह्याच्या गंगपूर भागात डोलोमाइट व चुनखडक काढण्यात येतात. 

प्रमुख नद्या :

      महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या राज्यातल्या मुख्य नद्या वायव्येकडून आग्नेयीकडे जवळजवळ समांतर वहात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यांच्याखेरीज राज्यात उत्तर भागात सालंदी, बुराबलंग व सुवर्णरेखा आणि दक्षिण भागात ऋषिकूल्या, वंशधारा, नागावली, इंद्रावती, कोलाब आणि मचकुंद या लहान नद्या आहेत. मध्य प्रदेशातून येणारी महानदी ओरिसात ८५३ किमी. लांब वाहते. ती येथील सर्वांत मोठी नदी असून १,३२,६०० चौ. किमी. क्षेत्रातले पाणी वाहून नेते आणि महापुराचे वेळी ४४,८०० घमी./से. किंवा जवळजवळ गंगेइतके पाणी बंगालच्या उपसागरात सोडते. अशा वेळी तिचे पात्र दीड किमी. पेक्षाही जास्त रुंदावते. ती अनेक मुखांनी सागराला मिळते. या व दुसऱ्या दोन नद्यांच्या मुखप्रवाहांचे एक जाळेच त्यांच्या त्रिभुजप्रदेशात बनले आहे. ओरिसातले मोठे जलाशय म्हणजे हिराकूद धरणाने झालेला तलाव आणि भरतीच्या वेळी खाऱ्या व ओहोटीच्यावेळी गोड्या पाण्याचे किनाऱ्याच्या आतले चिल्का सरोवर हे होत. राज्याचा ४८२ किमी. लांबीचा समुद्रकिनारा रेताड व नद्यांच्या गाळाने उथळ बनलेला आहे. 




महानदी, ओडिशा

शेती व मुख्य पिके :

               ओडिशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. ओडिशाची सुमारे 80 टक्के लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली आहे, येथील बहुतांश जमीन नापीक किंवा एकापेक्षा जास्त वार्षिक पिकांसाठी अयोग्य आहे.ओडिशामध्ये सुमारे 40 लाख शेततळे आहेत, ज्यांचे सरासरी आकार 1.5 हेक्टर आहे, परंतु दरडोई कृषी क्षेत्र 0.2 हेक्टरपेक्षा कमी आहे. राज्यातील एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ४५ टक्के शेतजमीन आहे.
      त्यातील 80 टक्के भाताचे पीक घेतले जाते. तेलबिया, कडधान्ये, ताग, ऊस आणि नारळ ही इतर महत्त्वाची पिके आहेत.आणि मान्सूनच्या पावसाच्या वेळेत आणि प्रमाणातील फरकामुळे, येथे उत्पादन कमी आहे.त्यांखेरीज अंबाडी, हळद, मिरची, मोहरी, तंबाखू वगैरे पिकांचे थोडे उत्पादन होते.
          राज्याला अनुकूल समुद्रकिनारा तसेच चिल्का सरोवर, हिराकूद जलाशय, इतर तळी व अनेक नद्या असूनही मच्छीमारीचा विकास पुरेसा नाही. समुद्रातून व चिल्का सरोवरातून मॅकेरल, सरंगा, हिलसा, वोय या जातीचे मासे काढण्यात येतात. मच्छीमारीच्या एकूण 14,300 चौ. किमी. क्षेत्रातून 4 कोटी रु. किंमतीचे मत्स्योत्पादन होते.

दळणवळण मार्ग :

राज्यात 1971 साली 1713 किमी. लांबीचे लोहमार्ग आग्‍नेय रेल्वेच्या कक्षेत पूर्व किनाऱ्याला, उत्तर सीमेवर आणि पश्चिमेकडे वळणारे असे होते. त्यात आणखी 211 किमी.ची भर खाणी व कारखान्यांच्या वाढत्या विकासासाठी दुसऱ्या व तिसऱ्या योजनांत मिळून पडली आणि संकल्पित बैलादिला-कोट्टलवलसा हा 502 किमी. मार्ग पुरा झाल्यावर राज्याच्या दूरच्या भागांपर्यंत रेलवाहतूक सुलभ होणार आहे.

भुवनेश्वरच्या मुख्य विमानतळा खेरीज राज्यात इतर तीन तळ व कित्येक धावपट्ट्या आहेत. शासकीय राज्यवाहतुकीच्या 450 वर बसगाड्या दिवसाला पाऊण लाख उतारूंची वाहतूक करतात. राज्याचे पारादीप बंदर भारताच्या आठ प्रथमश्रेणीच्या बंदरांपैकी एक आहे  व कच्च्या खनिजांच्या निर्यातीसाठी याचा उपयोग होऊ लागला आहे. चांदबाली व गोपालपूर ही ओरिसातली दुय्यम बंदरे आहेत त्यांचा उपयोग मुख्यत: मच्छीमारी नौकांना होतो.

उद्योग :-
     शासकीय क्षेत्रातील हिंदुस्थान स्टीलचा राउरकेला येथील प्रचंड पोलाद कारखाना वर्षाला १० लाख टन उत्पादन करीत आहे. त्याच्याभोवती व राज्यात अन्यत्र लोहसंबंधित व पूरक वस्तूंचे अनेक कारखाने, यंत्रमाग, लोखंडी नळ, ओतीव बीड, भट्टीच्या विटा, प्रशीतके, रसायने व खते तयार करू लागले आहेत. हिराकूदच्या विजेवर चालणारा ॲल्युमिनियमचा एक कारखाना वर्षाला १०,००० टन उत्पादन करीत आहे. त्याखेरीज ओरिसात सिमेंट, चिनी मातीच्या वस्तू, कागद, कापड, काच, साखर इ. मालांचे कारखाने, उपलब्ध कच्चामाल, पाणी, जळण, वीज आणि मजूर या सोयींचा फायदा घेऊन चालू झाले आहेत. 
राउरकेला येथील हिंदुस्थान स्टीलचा पोलाद कारखाना

भारतातील निकेलचा  पहिला कारखाना कटक जिल्यातील सुकिंदा येथे सुरू होत आहे. देशाच्या मँगॅनीज उत्पादनातील २० टक्के भाग ओरिसाचा आहे. शिवाय राज्यभर विविध लघुउद्योगांचे कारखाने आहेत. हस्तव्यवसाय व कुटीरोद्योग यांत मुख्यतः हातमाग कापड, बांबू व वेतकाम, विड्या, खेळणी, तांब्यापितळेच्या वस्तू, कलाकुसरीच्या उपयुक्त वस्तू व चांदीचे जाळीकाम अशा मालांचे उत्पादन होते. कटक हे औद्योगिक केंद्र व मुख्य बाजारपेठ आहे. पुरी, बलसोर, संबळपूर, भुवनेश्वर, चौद्वार व पर्लाकिमिडी येथेही प्रादेशिक व्यापार चालतो. राज्यात १९७१ साली १,७१३ किमी. लांबीचे लोहमार्ग आग्‍नेय रेल्वेच्या कक्षेत पूर्व किनाऱ्याला, उत्तर सीमेवर आणि पश्चिमेकडे वळणारे असे होते. त्यात आणखी २११ किमी.ची  भर खाणी व कारखान्यांच्या वाढत्या विकासासाठी दुसऱ्या व तिसऱ्या योजनांत मिळून पडली आणि संकल्पित बैलादिला-कोट्टलवलसा हा ५०२ किमी. मार्ग पुरा झाल्यावर राज्याच्या दूरच्या भागांपर्यंत रेलवाहतूक सुलभ होणार आहे. ओरिसातल्या सु. ७९,००० किमी. सडकांपैकी अंदाजे १३,००० किमी. पक्क्या आहेत. नद्या व कालव्यांमधून नौकानयनास योग्य असे जलमार्ग ३४७ किमी. आहेत. भुवनेश्वरच्या मुख्य विमानतळाखेरीज राज्यात इतर तीन तळ व कित्येक धावपट्ट्या आहेत. शासकीय राज्यवाहतुकीच्या ४५० वर बसगाड्या दिवसाला सु. पाऊण लाख उतारूंची वाहतूक करतात. ओरिसा मार्ग वाहतूक ही दुसरी यंत्रणा केंद्र, राज्य व सार्वजनिक अशा सामाईक स्वामित्वाची असून तीही सु. २०० वाहनांनी वर्षाला ४० लाख उतारूंची ने-आण करते. राज्याचे पारादीप बंदर भारताच्या आठ प्रथमश्रेणीच्या बंदरांपैकी एक आहे  व कच्च्या खनिजांच्या निर्यातीसाठी याचा उपयोग होऊ लागला आहे. चांदबाली व गोपालपूर ही ओरिसातली दुय्यम बंदरे आहेत त्यांचा उपयोग मुख्यत: मच्छीमारी नौकांना होतो.

ओडिशा राज्याची भाषा

ओडियाला ओडिशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे. मूळ रहिवासी आर्य कुटुंबातील होते आणि येथील भाषा बंगाली, आसामी आणि मैथिली सारखी आहे. वर्षानुवर्षे उडिया भाषेमध्ये बालेश्वरी, भात्री, लारिया, संबलपुरी, गंजमी, छत्तीसगढ़ी आणि मेदिनीपुरी यासारख्या भाषेत इतर अनेक भिन्नता निर्माण झाल्या आहेत. ही भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे आणि शेजारच्या राज्यांमध्ये देखील बोलली जाते. इतर राज्यांतून आलेल्या लोकांकडून येथे इतर भाषा बोलल्या जातात.

ओरिसाची ओडिया ही भाषा मागधी प्राकृत गटातील आहे. ओडिया लिपीचा विकास ब्राह्मी लिपीतून झाला आहे. या भाषेत अकराव्या शतकापासून ग्रंथरचना होऊ लागली. सोळाव्या शतकापर्यंतच्या आदियुगात बौद्धगान ओ दोहासारख्या धर्मपर व मादलापांजीसारख्या इतिहासस्वरूप रचना झाल्या. ओरिसाचा आद्यकवी ‘शूद्रमुनी ’ सारळा दास याची विलंका रामायणमहाभारत  व चंडीपुराण  ही काव्ये याच काळात झाली. मध्ययुगाच्या पूर्वार्धात किंवा भक्तियुगात पुरीच्या जगन्नाथभक्तांनी व चैतन्यशिष्यांनी अनेक भक्तिपर ग्रंथ लिहिले सालवेग नावाच्या मुसलमान भक्तानेही कवने रचली. त्याखेरीज विविध कवींच्या कपटकेलीशशिसेणासारख्या ललितकृती झाल्या. उत्तरार्धाच्या रीतियुगात शास्त्र, कला, संगीत अशा विषयांवरच्या अनेक काव्यलक्षणयुक्त रचना पंडितांनी व कवींनी केल्या.उपेंद्र भंज हा या काळातला सर्वश्रेष्ठ कवी मानण्यात येतो. त्याची पौराणिक काव्ये प्रगल्भ शैलीची आहेत. मध्ययुगांनंतरच्या काळात भक्तिप्रधान व रीतिप्रधान पद्धतींचा समन्वय झाला. हळूहळू फार्सी व हिंदी भाषांचा थोडा प्रभाव ओडियावर पडला. ब्रिटिशांच्या राजवटीबरोबर आधुनिक युग आले व राधानाथ राय, फकीरमोहन, मधुसूदन  राय, रामशंकर राय, गोपबंधू दास, मायाधर मानसिंह, कालिंदीचरण पाणिग्राही, सच्चिदानंद राऊन, गोपीनाथ महांती व नित्यानंद महापात्र अशा लेखकांनी काव्य, नाटक, कादंबरी अशा अनेक प्रकारांत साहित्यनिर्मिती करून ओडिया वाङ्‍यम आधुनिक युगात आणून ठेवले.

लोक व समाज :

            2011 च्या जनगणनेनुसार ओडिशा राज्याची लोकसंख्या 41,974,218 एवढी असून त्यातील पुरुषांचे प्रमाण 21,20 9,812 असून महिलांचे प्रमाण 20,774,406 असे आहे. साक्षरता दर 87.60%आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण 81.60 % तर महिलांचे प्रमाण 64 % आहे.
      लोकसंख्येपैकी 8.27 प्रतिशत लोक शहरात राहणारे होते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. रोजगारीसाठी आंध्र प्रदेश व इतर शेजारच्या राज्यांतून ओरिसात येणाऱ्या लोकांपेक्षा सु. एक लाख अधिक लोकांनी या राज्यातून मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व आसाममध्ये स्थलांतर केल्याचे आढळून आले आहे.
                ओरिसात वेळोवेळी वेगवेगळ्या वंशांचे लोक येऊन स्थायिक झाल्यामुळे राज्यातील प्रजा एकजिनसी नाही. लोकसंख्येत अनुसूचित जमातींचे प्रमाण १५·७ प्रतिशत आहे आणि आदिवासी २४ प्रतिशत आहेत. ९४ (१९६१) अनुसूचित जमातींपैकी पाण, गंदा, डोम, धोबा, बावरी व कांद्रा हे बहुसंख्य आहेत. आदिवासींच्या ६२ जमातींपैकी कोंड, गोंड, संताळ, सावरा, मुंडा, कोल, भुइयाँ, ओराओं, भूमिजी, भौमिया व शबर यांची संख्या जास्त आहे. कोरापुट, मयूरभंज, सुंदरगढ व गंजाम जिल्ह्यांत यांची वस्ती जास्त आहे. आदिवासींचे धर्म प्राथमिक स्वरूपाचे जडप्राणवादी आहेत. ओरिसातले इतर लोक बव्हंशी वैष्णव किंवा शैव पंथी हिंदुधर्मीय आहेत. पुरीचा जगन्नाथ हे राज्यातले प्रधान दैवत असून त्याच्या भक्तांखेरीज भुवनेश्वराचे शिवभक्त व अल्पप्रमाणात जैन मताचे लोक राज्यात आहेत. बहुसंख्य प्रजा कृषिव्यवसायी ग्रामीण असल्याने तिचे जीवन रूढीप्रमाणे व्यतीत होते. कारखाने व खाणींमुळे झालेल्या नव्या वस्तीच्या ठिकाणांतून मात्र लोकांची राहणी आधुनिक होऊ लागली आहे.  वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. रोजगारीसाठी आंध्र प्रदेश व इतर शेजारच्या राज्यांतून ओरिसात येणाऱ्या लोकांपेक्षा सु. एक लाख अधिक लोकांनी या राज्यातून मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व आसाममध्ये स्थलांतर केल्याचे आढळून आले. ग्रामीण ओरिसातील टुमदार खेडी माडा-आंब्यांच्या रायांत वसलेली असतात. मातीने रंगविलेल्या घरांच्या भिंतींवर चुन्याने काढलेल्या नक्षीत भात पिकांचे भारे, देवळे, हत्ती, वाघ असे चित्रविषय असतात. पुरुषांचा वेश सामान्यत: धोतर, बनिअन व खांद्यावर चादर आणि स्त्रियांचा गुडघ्याइतकी साडी असा असतो. आदिवासींच्या वन्य राहणीत जमातीनुसार फरक असतात.  त्यांचे उपजीविकेचे मार्ग शिकार, फळे गोळा करणे, फिरती किंवा एके जागी शेती असे आहेत तथापि खाणींतून आणि नवीन निघणाऱ्या कारखान्यांतून बरेच आदिवासी आता नियमित कामावर जाऊ लागले आहेत.

ओडिशातील महिलांची वेशभूषा

  ओडिशातील महिलांचा मुख्य पोशाख साडी आहे. जो भारतीय संस्कृतीचाही एक भाग आहे. त्यामुळे ओडिशातील महिलांच्या सौंदर्यातही भर पडते. ओडिशा कटकी साड्या आणि संबलपुरी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या साड्यांच्या डिझाईन्स अतिशय वेगवेगळ्या आणि सुंदर आहेत आणि येथील महिला विवाहसोहळा, लग्नसमारंभ आणि दैनंदिन जीवनात याचा मोठ्या अभिमानाने वापर करतात. हे वस्त्र अतिशय आरामदायक आहे. सलवार कमीज हा ओडिशातील मुलींचा पोशाख आहे, इथल्या स्त्रिया साड्यांसोबत मौल्यवान दागिने वगैरे वापरतात.

 ओडिशातील पुरुषांची वेशभूषा

   ओडिशातील बहुतेक लोक कष्टकरी आहेत. ग्रामीण भागात अजून बरेच आहेत. ओडिशात पुरुषांना स्वतःचा पारंपरिक पोशाख घालण्यात जास्त रस असतो. सामान्यतः, धोती कुर्ता हा ओडिशातील पुरुषांचा सामान्य पारंपारिक पोशाख आहे. ते सण, लग्न समारंभ इत्यादींमध्येही घालतात. धोती कुर्ता व्यतिरिक्त तो खांद्यावर गमछा घालतो. येथील लोक त्यांचे पारंपारिक धार्मिक पोशाख परिधान करण्याचे काटेकोरपणे पालन करतात. मात्र,  इंटरनेटचे आगमन, जलद दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधांमुळे त्यांच्या परंपरा आणि संस्कृती बदलत आहेत. त्यामुळे ड्रेस डिझाईनमध्ये बदल होत असून विविध प्रकारच्या पोशाख तरुण वापरताना दिसतात.

विधानसभा, ओडिशा

राज्यव्यवस्था : 

राज्याच्या विधानसभेत १४० लोकनियुक्त सदस्य असून त्यांपैकी २२ अनुसूचित जाती व ३४ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या साहाय्याने राज्यकारभार सांभाळतो. राज्यात विविध पक्ष असून मार्च १९७१च्या निवडणुकीत नवकाँग्रेस ५१, जुनी काँग्रेस १, उत्कल काँग्रेस ३२, जनकाँग्रेस १, स्वतंत्र ३६, समाजवादी ४, झारखंड ४, कम्युनिस्ट ६ व अपक्ष ४ निवडून आले. उत्कल काँग्रेस, स्वतंत्र व झारखंड पक्ष यांचे संमिश्र मंत्रिमंडळ विश्वनाथ दास यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आले. मार्च १९७३ मध्ये राष्ट्रपती राजवट सुरू झाली. फेब्रुवारी १९७४च्या निवडणुकांत नवकाँग्रेस पक्षाचे बहुमत होऊन श्रीमती नंदिनी सत्पथी यांचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. कारभाराच्या सोईसाठी राज्याचे घटक पुरी, ढेकांनाल, फुलबानी, बलसोर, संबळपूर, गंजाम, कोरापुट, मयूरभंज, सुंदरगढ, बोलानगीर, कोक्राझार व कालाहंडी या १३ जिल्ह्यांची ५२ महसुली उपविभाग व त्यांची तहसिलात विभागणी केली आहे. राज्यात १९ नगरपालिका, १३ जिल्हा परिषदा, ४४ अधिसूचित क्षेत्रसमित्या, ३१४ पंचायत समित्या व ३,८३१ ग्रामपंचायती १९६१ पासून क्रमश: विकेंद्रित शासनाच्या प्रयोगात अधिकाऱ्यांच्या मदतीने सहभागी होत आहेत. वरिष्ठ न्यायालयात प्रमुख न्यायमूर्ती व चार साहाय्यक न्यायमूर्ती आहेत. जिल्हावार न्यायव्यवस्थेत सत्रन्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी व त्यांचे कनिष्ठ अधिकारी अंतर्भूत आहेत. भारताच्या लोकसभेत २० व राज्यसभेत १० सदस्य ओरिसातून निवडून जातात.

ओडिशा उच्च न्यायालय, कटक

कला : 

ओडिशाला समृद्ध कलात्मक वारसा आहे आणि त्याने भारतीय कला आणि वास्तुकलेची उत्कृष्ट उदाहरणे निर्माण केली आहेत. भित्तिचित्रे, दगड आणि लाकडावरील कोरीवकाम, देव चित्रे (पट्टा पेंटिंग म्हणून ओळखले जाते) आणि ताडाच्या पानांवरील चित्रांद्वारे आजही कलात्मक परंपरा जपल्या जातात. आजुबाजूच्या उपलब्ध साहित्याचा उपयोग करून कारागीर अनेक शोभिवंत वस्तू तयार करतात. पुरीचे आणि परिसरातले शिल्पकार साध्या दगडांतून ओरिसातल्या भव्य वास्तूंच्या प्रतिकृती कोरून काढतात. कोणार्क आणि भुवनेश्वराच्या देवळांतील देवता आणि इतर आकृतीचे सुंदर छोटे नमुने मऊ दगडांतून हुबेहुब तयार करतात. इकडची लाकडी खेळणी आणि जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती वास्तवदर्शी नसून प्रतीकात्मक असतात आणि विविध चमकदार रंगांनी त्या मोठ्या वेधक दिसतात. तशीच साध्यासोप्या पद्धतीने, ओबडधोबड कागदावर रंगवलेली ओरिसाची परंपरागत ‘पट’ चित्रे ढोबळ शैलीची, अवास्तव व भडक असूनही त्यांच्या संरचना व लयरचना लक्षणीय असतात. नाजुक नक्षीदार चांदीचे जाळीकाम ही कटकची एक विशेष कला आहे. अशा पद्धतीने बनविलेले दागिने व शोभेच्या वस्तू देशभर विख्यात आहेत. संबळपूरच्या हातमाग साड्या व मयूरभंज, सोनेपूर व बेहरामपूरचे रेशमी व टसर कापड प्रसिद्ध आहे. पर्लाकिमिडी व कटक येथे हस्तिदंत व शिंगावरीस उत्तम कोरीवकाम होते. ओरिसातले प्रमुख उत्सव मे-जूनमधील पुरीची चंदनयात्रा, जून-जुलैमधील त्रिखंडकीर्तीची जगन्नाथ रथयात्रा, फेब्रुवारीतील  कोणार्कचा एक दिवसाचा मेळा व नोव्हेंबरमधील कटकची बलीयात्रा हे होत. या उत्सवांना राज्यातून व बाहेरून लाखोंनी लोक जमतात. 

नृत्य :-

ओरिसामधील विविध प्रकारची नृत्ये ताल, हालचाल, भक्ती यांची एकत्रित अभिव्यक्ती  दाखवतात. ओडिसी नृत्यात शरीर, पाय आणि हातांच्या स्थितीच्या कठोर नियमांचे पालन केले जाते आणि हे सर्व शतकांपूर्वी खडकामध्ये शिल्पित केलेल्या आकृत्यांमध्ये कोरुन ठेवले आहे. लोकनृत्य सहसा सणांच्या वेळी सादर केले जातात आणि दंड नाता, विधी नृत्य अशी विविध रूपे घेतात.
   ओडिसी हा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ज्यामध्ये मुद्रा, भाव आणि गीतात्मक गुणांना महत्व दिले जाते ओडिसी नृत्य दर्शकांना शब्दांपलीकडे जाणारा अनुभव देते. हे नृत्य मंदिराच्या नाट्यविधी अर्पण म्हणून सादर केले गेले होते

नृत्य
           आदिवासी भागात लोकनृत्यांचे अनेक प्रकार आहेत. खेड्यापाड्यात वाद्य आणि बासरीचे संगीत प्रचलित आहे. ओरिसा, ओडिशाचे शास्त्रीय नृत्य 700 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. मूलतः ते देवासाठी मंदिर नृत्य होते. नृत्य प्रकार, हालचाली, मुद्रा आणि मोठ्या मंदिरांच्या भिंतींवर कोरलेले आहेत, विशेषत: कोणार्कमध्ये, शिल्प आणि नक्षीच्या स्वरूपात, या नृत्याच्या आधुनिक प्रवर्तकांनी ते राज्याबाहेरही लोकप्रिय केले आहे. मयूरभंज आणि सरायकेला प्रदेशातील छाऊ नृत्य (मुखवटा घातलेल्या कलाकारांनी सादर केलेले नृत्य) हा ओडिशाच्या संस्कृतीचा आणखी एक वारसा आहे. मूलत: ग्रामीण जीवनातून स्फूर्ती घेणाऱ्या लोककला ओरिसात विकसित झाल्या आहेत. मूळ ओरिसामधील  ओडिसा नृत्याची परंपरा फार जुनी असून संगीत नाट्य अकादमीने या नृत्यप्रकारास मान्यता दिली आहे. ओरिसामधील निरनिराळ्या आदिवासी लोकांमध्ये प्रसंगोपात्त केली जाणारी नृत्येही वैशिष्ट्यपूर्ण असतात. शेती हाच बहुसंख्य लोकांचा व्यवसाय असल्याने पावसासाठी, सुगीनंतर अथवा गाईबैलांकरिता निर्माण झालेले सण ओरिसाभर पाळले जातात. आदिवासी नृत्य जसे की ‘गोधा’, प्रजा विवाह नृत्य आणि रंगीबेरंगी गोंड नृत्य, मिरर आणि फेटा पगडीमध्ये सादर केले जातात. छाऊ, मुखवटा घातलेले नृत्य नाटक जे ओरिसाच्या भूतकाळाची आठवण करून देते.
1952 मध्ये, कला विकास केंद्राची स्थापना कटक येथे झाली, ज्यामध्ये नृत्य आणि संगीताच्या प्रचारासाठी सहा वर्षांचा अध्यापन अभ्यासक्रम आहे. यासाठी राष्ट्रीय संगीत संघटना (राष्ट्रीय संगीत समिती) देखील तेथे आहे .

सण, उत्सव :

भारतीय संस्कृती आणि परंपरेचा एक मोठा भाग म्‍हणजे सण- उत्‍सव आहे. इथल्या उत्सवांमध्येही भारताची विविधता दिसून येते. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण साजरे केले जातात. जे त्या राज्याच्या समृद्ध संस्कृतीबद्दल बोलतात. असेच काहीसे ओडिशामध्येही पाहायला मिळते. सामान्यत: जेव्हा ओडिसाच्या उत्सवांचा विचार केला जातो; तेव्हा ते केवळ रथयात्रेशी जोडले गेलेले दिसतात. तर राज्यात यापेक्षा बरेच काही साजरे होत असते. याबाबत अनेकांना माहिती नाही. दुर्गापूजा आणि रथयात्रेव्यतिरिक्त असे अनेक सणही येथे आहेत जसे कलिंग महोत्सव, चंदन यात्रा, कोणार्क नृत्य महोत्सव, महा बिशवु संक्रांती , राजा परब, रथयात्रा, मघासप्तमी, मकर मेळा, छाऊ उत्सव, पुरी बीच महोत्स्व, नौखाई इ.  मेळा आणि सण साजरे करण्याची ओरिसाची स्वतःची पद्धत आहे. कालिजल बेटावरील मकर मेळा, चिल्का तलाव, भुवनेश्वरचा आदिवासी मेळा, दुर्गा पूजा, भुवनेश्वरच्या भगवान लिंगराजाचा कार उत्सव आणि पुरीतील रथयात्रा हे ओरिसाचे काही प्रसिद्ध मेळे आणि उत्सव आहेत. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या तीन देवतांना रथ मिरवणुकीत त्यांच्या उन्हाळी मंदिरात आठवडाभर नेले जाते.ओडिशामध्ये अशाच साजरा होणाऱ्या काही रंगीबेरंगी उत्सवांबद्दल माहिती जाणून घ्‍या.

दुर्गा पूजा

 बंगालीं लोकांसाठी दुर्गा पूजा तितकीच महत्वाची आहे जितकी ओडिशाच्या लोकांसाठी आहे. अश्विन किंवा कार्तिक महिन्यात सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान सत्‍याच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी. महिषासुर विरूद्धच्या विजयाबद्दल हा महोत्सव दुर्गा माँची शक्ती साजरा करतो.चमचमणारे दिवे रस्त्यावर सर्वत्र उजळताना दिसतात. रस्त्यांवर उभारलेल्या मंडपामध्ये लक्ष्मीसमवेत देवी सरस्वती आणि देवी दुर्गा यांच्यासह देवी आणि गणेश कार्तिक यांच्या प्रचंड मूर्तीची प्रतिष्ठापणा केली असते. हा उत्सव ओडिशामधील लोकांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे.

रथ महोत्सव
दुर्गापूजनाशिवाय ओडिशातील रथयात्रा किंवा रथोत्सव हा आणखी एक महत्त्वाचा सण आहे. हा सण इतका लोकप्रिय आहे की ओडिशामध्ये देशभरातून आणि जगभरातील लोक उत्सव साजरा करण्यासाठी येतात. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री आयोजित केले जाते. हा उत्सव भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि सुभद्रा देवी प्रित्यर्थ साजरा केला जातो. ओडिशाच्या पुरी येथे त्या सणाच्या वेळी त्यांच्या मूर्ती आंघोळीसाठी बाहेर काढल्या जातात. या उत्सवाचा काळ १४ दिवसांचा असतो. सणांच्या वेळी अनेक प्रथा आणि धार्मिक प्रथा परंपरेनुसार केल्या जातात.

कलिंग उत्सव

ओडिशातील लोकांद्वारे साजरा केला जाणारा लोकप्रिय उत्सव म्हणजे कलिंग महोत्सव. हा उत्सव साजरा करण्यामागे एक वेगळी कथा आहे, ज्याबद्दल फार माहिती नसेल. ओडिशाचा एक मोठा भाग, कलिंग म्हणून ओळखला जातो. अशोकाच्या कारकिर्दीत अनेक वीर युध्द्दात ठार झाले. कलिंग महोत्सव युद्धावरील शांततेचा विजय साजरा करण्यासाठी सुरू करण्यात आला होता. या महोत्सवात मौर्य घराण्याच्या वीरांच्या अनेक युद्धकलांचे प्रदर्शन केले जाते. भुवनेश्वरमधील धौली शांती स्तूपात ही कला सादर केली जाते.

छाऊ उत्सव

ओडिशातील आणखी एक महत्त्वाचा आणि लोकप्रिय उत्सव म्हणजे छाउ महोत्सव. हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो आणि ओडिशामधील भुयान आदिवासी हा साजरा करतात. या उत्सवात ओडिशातील लोक छाऊ नृत्य सादर करतात.छाउ नृत्य हा नृत्यचा पारंपारिक प्रकार आहे ज्यामध्ये मार्शल आर्ट्स आणि लोकनृत्य यांचा संयोग समाविष्ट आहे. छाऊ नृत्य दरम्यान मुखवटे आणि पारंपारिक पोशाख  घातले जातात त्यामुळे नृत्याचा रोमांच आणखी वाढतो.

सीतल शास्ती कार्निवल
या उत्सवाचे नाव एकदम वेगळे आहे. सीतल षष्ठी हा एक लोकप्रिय उत्सव आहे जो वार्षिक उत्सव म्हणून साजरा केला जातो. पार्वतीबरोबर भगवान शिव यांचा विवाह  उत्सव स्वरुपात साजरा केला जातो. हा एक सर्वात लोकप्रिय सण आहे आणि ओडिशामधील सर्व शिव मंदिरांमध्ये साजरा केला जातो. हा सण जेष्ठ महिन्यात शुक्ल पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो. उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या मध्ये हा सण साजरा केला जाते. हा मुख्यतः ओडिशाच्या पश्चिम भागात साजरा केला जातो.

ओडिशातील ‘बाली जात्रा’

   बाली जात्रा म्हणजे इंडोनेशियातील बाली बेटाकडे जाण्यासाठी प्राचीन काळी केली जाणारी समुद्रयात्रा. प्राचीन काळी इंडोनेशियातील जावा, सुमात्रा, बाली इत्यादी बेटांवर व्यापारानिमित्त जाणाऱ्या ओडिशातील व्यापाऱ्यांची आणि खलाश्यांची आठवण या बाली जात्रेच्या उत्सवाच्या रूपानं ओडिशामध्ये जपली गेली आहे. इंडोनेशियाकडे जहाजानं जाण्यासाठी व्यापारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करत असत. हे व्यापारी सुखरूप घरी परत यावेत यासाठी त्यांच्या पत्नी, घरातील स्त्रिया त्या वेळी नदीत नावांच्या प्रतिकृती सोडत असत, असं ओडिशातील परंपरा सांगते.
     बाली जात्रा हा ओडिशातील मोठा उत्सव आहे. हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला कटक शहरातील महानदीच्या तीरावर साजरा केला जातो. कटक येथे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी, म्हणजे कार्तिक पौर्णिमेला, ‘बोईता बंदना’ (म्हणजे ‘नाव-वंदन’) असते. ‘बोईता’ म्हणजे नाव. एक छोटी नाव तयार करून तीत फुलं आणि दिवा ठेवून ती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत किंवा तलावात सोडली जाते.
   पारंपरिकरीत्या केळीच्या झाडाच्या खोडापासून ही छोटी नाव तयार केली जात असे. आता कागद, कार्डबोर्ड वापरूनही या नावा तयार केल्या जातात आणि शंखांच्या, घंटांच्या निनादात त्या नदीत सोडल्या जातात. ‘आमचे कुटुंबीय समुद्रयात्रा करून सुखरूप घरी परत यावेत यासाठी आम्ही समुद्राला पान आणि सुपारी वाहत आहोत...’ अशी प्रार्थना या नावांच्या प्रतिकृती नदीत सोडताना केली जाते. ही ‘बोईता-बंदना’ आता केवळ एक परंपरा म्हणून केली जात असली तरी तीतून ओडिशातील प्राचीन काळात केल्या जाणाऱ्या समुद्री यात्रांची स्मृती जपली गेली आहे.
      ओडिशाची राजधानी कटक येथून भुवनेश्वर येथे आल्यावर भुवनेश्वरमध्येदेखील बाली जात्रा साजरी केली जाऊ लागली. हा उत्सव साजरा केल्या जाणाऱ्या रस्त्यांवर किंवा नदीकाठच्या भागात उभारलेल्या कमानींवर नावेची प्रतिकृती केलेली असते. या उत्सवासाठी अनेक खाद्यपदार्थ, विविध वस्तू यांचे स्टॉल लागलेले असतात. या उत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. कटक आणि भुवनेश्वर येथील या उत्सवाला आपल्याकडील गणेशोत्सवासारखी किंवा नवरात्रासारखी गर्दी होते.
     बाली बेटावरील हिंदू संस्कृतीच्या खुणा आजही कशा दिसून येतात हे जाणवते. याशिवाय, इंडोनेशियात काही ठिकाणी केल्या गेलेल्या उत्खननात प्राचीन काळातील भारतीय बनावटीच्या भांड्यांचे तुकडे सापडले आहेत. यावरूनही भारत आणि इंडोनेशियातील व्यापारीसंपर्क लक्षात येतो. अर्थात्, परंपरेनं ओडिशातील हा उत्सव केवळ बाली बेटाचं नाव टिकवून असला तरी भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून इंडोनेशिया, व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, चीन इत्यादी देशांमध्येही व्यापारानिमित्त भारतीय प्रवास करत होते.
 पूर्व किनाऱ्यावरील बंदरं
     ओडिशात प्राचीन काळी कलिंग नावाचं राज्य होतं. या राज्याच्या किनारी प्रदेशात तामलुक, बारूआ बंदर, कलिंगपटण इत्यादी महत्त्वाची बंदरं होती. ओडिशातील प्रसिद्ध चिल्का सरोवराच्या परिसरातदेखील नैसर्गिक बंदरं होती. काही मध्ययुगीन ग्रंथांतून उल्लेख केल्यानुसार, चिल्का सरोवराच्या परिसरातील बंदरांत इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, चीन इत्यादी देशांत जाणारी जहाजं उभी असत. चिल्का सरोवराच्या परिसरात केलेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात काही प्राचीन बंदरांचे अवशेष आढळून आले आहेत. या सरोवराच्या जवळ असलेल्या माणिकपटण या ठिकाणी एक महत्त्वाचं बंदर होतं.
       ओडिशातील मध्ययुगात वापरल्या गेलेल्या काही बंदरांच्या ठिकाणी पुरातत्त्वीय सर्वेक्षण केल्यावर चिनी बनावटीच्या भांड्यांचे तुकडेदेखील सापडले आहेत. यावरून मध्ययुगातील भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या व्यापाराची कल्पना येते. ओडिशातील विविध पुरातत्त्वीय स्थळांतून आणि प्राचीन, मध्ययुगीन बंदरांच्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यांवरून ओडिशातील किनाऱ्यावरून आशियातील विविध देशांशी व्यापार सुरू होता हे समजतं.
      समुद्राची पातळी बदलणं, बंदरात गाळ भरणं, किनारपट्टीची झीज इत्यादी भौगोलिक बदलांमुळे ओडिशातील अनेक बंदरं लयाला गेली. ओडिशातील प्रसिद्ध अशा कोणार्क या ठिकाणीही बंदर होतं. समुद्रपातळी बदलल्यानं कोणार्क हे ठिकाण आता समुद्रकिनाऱ्यापासून काही किलोमीटर दूर आहे. चिल्का सरोवराच्या परिसरातील बंदरं गाळ भरल्यानं कालांतरानं वापरयोग्य राहिली नाहीत.
जलप्रवासाशी संबंधित काही जहाजांची शिल्पं भुवनेश्वरमधील मंदिरांच्या परिसरात आढळली होती. ती आता भुवनेश्वर येथील संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.
     याशिवाय ओडिशातील रत्नगिरी येथे असलेल्या बौद्ध विहाराच्या परिसरात एक महत्त्वाचा पुरावा आढळतो. बौद्ध धर्मातील अवलोकितेश्वर आणि तारा या देवता व्यापाऱ्यांसाठी रक्षणकर्त्या देवता म्हणून महत्त्वाच्या होत्या. सिंह, हत्ती, चोर इत्यादींच्या हल्ल्यात किंवा इतर संकटांत व्यापारी सापडले तर या दोन देवता त्यांना संकटातून सोडवतील अशी व्यापाऱ्यांची धारणा होती. ओडिशातील रत्नगिरी येथे असलेल्या बौद्ध विहारातील परिसरात अशा आठ भयांपासून रक्षण करणाऱ्या तारा या बौद्ध स्त्रीदेवतेचं शिल्प आढळून आलं आहे.
      या शिल्पात मध्यभागी हातात कमळ घेऊन उभी असलेली तारा ही देवता दाखवण्यात आली आहे. तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूला छोटी शिल्पं आहेत. या शिल्पांतून ही तारा देवता कोणत्या प्रसंगी भक्तांचं रक्षण करते हे दाखवलेलं आहे. या शिल्पात देवतेच्या उजव्या बाजूला सगळ्यात खालच्या चौकोनात एक शिडाचं जहाजदेखील आहे. या जहाजाच्या शिल्पाचा अर्थ बुडणाऱ्या जहाजाला आणि त्यावरील प्रवाशांना तारा ही देवता वाचवते असा होतो.
    विविध पुरातत्त्वीय आणि कलास्थापत्यातील पुरावे यांवरून भारत आणि आग्नेय आशियातील देशांतील संपर्क आणि सांस्कृतिक संबंध आपल्याला दिसून येतातच; मात्र, प्राचीन काळी बाली बेटाकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समुद्रयात्रेची स्मृती ‘बाली जात्रा’ या उत्सवाच्या रूपानं ओडिशामध्ये अजूनही जपली गेली आहे हे विशेष.

सॅण्ड आर्ट फेस्टिवल :-
भारताच्या पूर्व किनार्‍यावर बंगालच्या उपसागरामध्ये शांतपणे पाय सोडून बसलेला प्रदेश म्हणजे ओडिशा. निसर्गाने आपल्या दोन्ही हातांनी या प्रदेशाला भरभरून दान दिलेले आहे. जगन्नाथपुरी, कोणार्क, भुवनेश्वर इथली भव्यदिव्य मंदिरे, पिपली आर्ट, पट्टचित्र सारख्या विविध कला, संस्कृती, यांची रेलचेल या प्रदेशात पाहायला मिळते. भुवनेश्वर हे राजधानीचे शहर म्हणजे मंदिरांची नगरी म्हणूनच ओळखले जाते. नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ म्हणजे पर्यटकांसाठी सुगीचे दिवस. या दिवसात अनेक पर्यटक ओडिशामध्ये येत असतात. हेच निमित्त साधून ओडिशा सरकार विविध उत्सवांचे आयोजन करते. त्यातले अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत होणारे कोणार्क ‘डान्स फेस्टिवल’ आणि कोणार्कच्याच चंद्रभागा किनाऱ्यावर वर होत असलेला ‘सॅण्ड आर्ट फेस्टिवल’ हे दोन महोत्सव. या दोन्ही उत्सवांसाठी भारतातून तसेच परदेशातूनही विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात.

सॅण्ड आर्ट म्हणजेच वाळूची शिल्पे. ओडिशामधील सुदर्शन पटनायक या कलाकारामुळे हा प्रकार सगळ्या जगभर ओळखला जाऊ लागला. सुदर्शन पटनायक यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवलेले आहे. जगन्नाथ पुरीच्या समुद्रकिनार्‍यावर वेगवेगळ्या विषयांवर वाळूची शिल्पे करणे यात सुदर्शन पटनायक यांचा हातखंडा आहे. सामाजिक, राजकीय, किंवा जागतिक पातळीवर एखादी महत्त्वाची घटना घडली की त्या घटनेवर आधारित अत्यंत देखणे असे वाळूशिल्प सुदर्शन पटनाईक तयार करतात. या कलाप्रकाराला उत्तेजना मिळावी म्हणून ओडिशा सरकारतर्फे आता सॅण्ड आर्ट फेस्टिवल दरवर्षी साजरा केला जातो. हा फेस्टिवल म्हणजे वाळूशिल्पे करणाऱ्या कलाकारांसाठी एक पर्वणीच असते. भारताच्या विविध प्रांतातून इथे कलाकार आपली कला सादर करतात. समुद्रकिनाऱ्यावर एकाशेजारी एक सलग अशी वेगवेगळ्या कलाकारांची वाळूशिल्पे आपल्याला बघायला मिळतात.
    पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज एक संकल्पना घेऊन वाळूचे शिल्प करायचे असते. जेव्हा भुवनेश्वरमध्ये विश्वचषक हॉकीचे सामने खेळले गेले. त्यामुळे तिथे वारसा, महिला सक्षमीकरण, प्लास्टिकचा भस्मासुर यासोबत हॉकी ही सुद्धा संकल्पना ठेवलेली होती. प्रत्येक कलाकाराने या संकल्पनेनुसार शिल्प करायचे असते. त्यांना त्याच्यासाठी पाच तासांचा वेळ दिला जातो. वाळूशिल्पे करताना ती भुसभुशीत होऊ नयेत म्हणून मधून मधून त्याच्यावरती पाणी शिंपडले जाते. याकामी अनेक स्वयंसेवक कलाकारांना मदत करत असतात. पर्यटकांना सुद्धा वाळूशिल्पे कशी तयार केली जातात याचे प्रात्यक्षिक तिथे पाहता येते.

कोणार्क इथला नृत्य महोत्सवसुद्धा याच पाच दिवसात भरवला जातो. नृत्य महोत्सव आणि त्याच्याच बरोबर होणारा हा सॅण्ड आर्ट फेस्टिव्हल या दोन्ही उत्सवांची जगभरात नोंद घेतली जाते. भारतीयांसोबतच परदेशी पर्यटकसुद्धा याकाळात इथे आवर्जून उपस्थित राहतात. नृत्य महोत्सव बघायला आलेल्या रसिकांना तिथून दोनच किलोमीटरवर असलेला सॅण्ड आर्ट फेस्टिवलसुद्धा बघता येतो. दुपारपासून वाळूशिल्पे करण्याचे काम सुरु होते आणि ते जवळजवळ सूर्यास्तापर्यंत पूर्ण होते. या कलाकारांची कला मनसोक्त अनुभवून आपण तिथेच २ कि. मी. वर असलेल्या डान्स फेस्टिवलला जाऊ शकतो, नव्हे जायचेच असते. हे दोन्ही उत्सव हाच तर ओडीशाच्या कलेचा मोठा खजिना आहे. नृत्य महोत्सव हा संध्याकाळी ६ वाजता सुरु होतो. कोणार्कच्या सूर्यमंदिराच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव केला जातो. मोठ्या हिरवळीवर रंगमंच उभारलेला असतो आणि त्याच्यासमोर स्टेडीयम सारखी बसण्याची व्यवस्था केलेली असते. देशभरातून कलाकार या उत्सवात आपली नृत्यकला सदर करण्यासाठी येत असतात. शिवाय खास ओडिसी नृत्याचा कार्यक्रम तर ठरलेला असतोच. या कार्यक्रमासाठी तिकीट आहे. ही तिकिटे अनेक हॉटेल्समध्येही मिळतात नाहीतर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असतातच. संपूर्ण अंधार आणि दिव्यांच्या रचनेमुळे उजळत जाणारे सूर्यमंदिर आणि त्याच्यासमोर होत असलेला हा नृत्य महोत्सव पाहून डोळ्याचे पारणे फिटते. ड्रोनद्वारे त्याचे होणारे चित्रीकरण आणि बाजूलाच असलेल्या दोन मोठ्या पडद्यावर दिसणारे त्याचे चित्रण फारच देखणे असते.

सॅण्ड आर्ट म्हणजे वाळू शिल्पकला हळूहळू भारताच्या विविध प्रांतात आता प्रसिद्ध होऊ लागली आहे. दरवर्षी इथल्या उत्सवामध्ये गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ इथल्या कलाकारांचा सहभाग असतो. त्याचसोबत श्रीलंका, जपान, इटली, जर्मनी, स्पेन, नॉर्वे या देशातील कलाकार सुद्धा इथे हजेरी लावतात आणि आपली वाळूशिल्प कला सादर करतात. त्याचसोबत महाराष्ट्रातील काही कलाकार सुद्धा इथे आपली वाळूशिल्प कला सादर करण्यासाठी आवर्जून येतात. आपल्याकडे कोकण पर्यटनात वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर इथल्या समुद्र किनाऱ्यावरसुद्धा वाळूशिल्पे साकारली जाऊ शकतात. मात्र आपल्याकडे सर्वथरात असलेली कमालीची उदासीनता याच्या मुळावर आलेली दिसते. ओडिशा सारखे छोटेसे राज्य आपल्याकडे असलेल्या वारशाचे इतके सुंदर मार्केटिंग करत असताना आपले राज्य मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसते.
     समुद्रावर वाळूत किल्ला करणे किंवा घर बांधणे हा प्रत्येकाचा अगदी आवडीचा खेळ असतो. केव्हा ना केव्हा आपण हा सुंदर खेळ वाळूत खेळलेला असेलही. पण याच खेळाचे शास्त्रोक्त आणि भव्य स्वरूप आपल्याला ओडिशा इथे या सँड आर्ट फेस्टिवल मध्ये बघायला मिळते. वाळूशिल्प ही कला त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर गेलेली दिसते. ओडिशा सरकारच्या या उपक्रमामुळे कलाकारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन दिले जाते. त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. इतका सुंदर महोत्सव आपल्या महाराष्ट्रातही व्हायला हवा जेणेकरून आपल्या कलाकारांना आणि पर्यटकांनासुद्धा ह्या सुंदर पर्वणीचा लाभ घेता येईल.
    कोणार्कच्या चंद्रभागा बीचवर एका सलग रांगेत उभी असलेली ही वाळूशिल्पे पाहताना तिथून पाय हलत नाहीत. प्रत्येक वाळूशिल्पावर रंगीत छत्रीचे आच्छादन असते. समोर समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, त्यावर डोलणाऱ्या नौका आणि त्या पार्श्वभूमीवर इथे वाळूत साकारलेली हे अत्यंत देखणी वाळूशिल्पे. सगळा परिसर कलेच्या या अलौकिक आविष्काराने भारावलेला असतो. निसर्गाने आधीच नटलेल्या ओडिशाचे सौन्दर्य, या उत्सवांमुळे आणि तो पाहायला आलेल्या पर्यटकांमुळे अजूनच खुलून दिसते.
आशुतोष बापट

ओडीशाची स्वयंपाक पध्दती –

    तांदूळ हे ओडिशाचे मुख्य पीक आहे सहाजिकच भात हे मुख्य अन्न आहे . भात, भाज्या, खिचडी, आलू पालक साग असे काही शाकाहारी पदार्थ आहेत. ओडिशाच्या ठराविक पदार्थांमध्ये ‘सागा’, ‘भाजी’, ‘भात’, ‘डाळ’, ‘बेसरा’ किंवा ‘महुरा’ (मसालेदार करी), मासे आणि चटणी किंवा ‘आंबट’ यांचा समावेश होतो.
ओडिशातील लोक नारळ, मनुका, सुका मेवा आणि मसाल्यांनी शिजवलेल्या चणा डाळीचा आस्वाद घेतात. ‘दलमा’, ‘पखल’, ‘मिठा भात’ आणि ‘पुलाओ’ हे तांदळाचे काही विशेष पदार्थ आहेत.
     ओरिसाचे पारंपारिक जेवण मसालेदार आहे आणि त्यात तांदूळ, भाज्या, डाळी, चटण्या आणि लोणचे यांचा समावेश आहे. महाप्रसाद, देवांचे अन्न, फक्त मंदिरांमध्ये शिजवले जाते आणि हा प्रसाद चुलीच्या आगीवर मातीच्या भांड्यात शिजवले जाते. वाफवलेल्या अन्नात तांदूळ, डाळ, भाज्या, करी आणि गोड पदार्थांचा समावेश आहे.
    ओरिसा हे प्रामुख्याने दुधापासून तयार केलेल्या गोड पदार्थांसाठी ओळखली जाते .रसगुल्ला, रस्मालाई ,चेनापोडा ,खीरामोहन, राजाभोग,रबडी, रसबली आणि पीठा हे काही ठराविक गोड पदार्थ आहेत.
गहू, इतर धान्ये आणि भाज्यांचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जरी तांदूळ जवळजवळ सर्व शाकाहारी पदार्थांमध्ये वापरला जात असला तरी, वेगवेगळ्या मसाल्यांच्या वापरामुळे जीरा पाकळा, भेंडी भाजा, आलू पाक साग आणि कडली या पदार्थांना वेगवेगळी चव येते.ओडिशातील लोकांमध्ये आणखी एक प्रसिद्ध अन्न म्हणजे ‘बेसारा’ जो मिश्र भाज्यांनी शिजवला जातो. ‘चेनकेडा’, ‘चिंगरी मलाई’, ‘दही बैंगण’, ‘दही माचा’, ‘घुगनी’ हे इतर स्वादिष्ट पदार्थ आहेत.
   पारंपारिक ‘दालमा’, बटाटे, वांगी आणि पालक यांसारख्या भाज्यांसह शिजवलेली मसूर, स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे. सांतुला (ओडिया शैलीतील मिश्र भाज्या), मूग डाळमा, शेग भाजा (तळलेला पालक), दही वांगी (दह्यासह शिजवलेले वांगी), चिंगुडी तरकारी, (कोळंबीची करी) हे इतर पारंपारिक पदार्थ आहेत. मोठा चुरा खजूर, गोड आणि आंबट टोमॅटो सॉससोबत खजूर खातो.
   ओडीशाच्या विस्तीर्ण किनारपट्टीमुळे, मोठ्या संख्येने लोक मासे आणि समुद्री खाद्यपदार्थांचे सेवन करतात. सर्वात लोकप्रिय आणि तोंडाला पाणी आणणारे पदार्थ म्हणजे कोळंबी, मासे, खेकडे. याशिवाय विशेष डिशमध्ये माखी करी, प्रॉन मलाई करी, केबडा कालिया आणि चिली फिश यांचा समावेश आहे. ‘चणेवेडा’ हा आणखी एक स्वादिष्ट पदार्थ आहे.

 ओडिशाचे पाच खास गोड पदार्थ -


ओडिशाची अन्नसंस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. इथले पदार्थ कमी तेलकट आणि पचायला सोपे असतात. पुरीमध्ये जगन्नाथ देवाला नैवेद्य म्हणून दाखवल्या जाणाऱ्या ५६ पदार्थांतून ओडिशाच्या खाद्यपदार्थांतील वैविध्य दिसून येते. त्यात मुख्य पदार्थांशिवाय असलेल्या पाच प्रसिद्ध गोड पदार्थांची माहिती पुढे दिली आहे.

रसगुल्ला

Rasagulla

हा पारंपरिक गोड पदार्थ असून रथयात्रेदरम्यान लक्ष्मी देवीला त्याचा नैवेद्य दाखवला जातो. जर तुम्हाला सर्वोत्कृष्ट रसगुल्ला चाखायचा असेल, तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचवर भुवनेश्वर आणि कटकदरम्यान असलेल्या पहाळा या गावाला भेट द्या. या पदार्थाच्या लोकप्रियतेमुळे ३० जुलै हा दिवस रसगुल्ला दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

छेन पोडा

Chhena Poda

चेन पोडा हा पदार्थ चीज, साखर, काजू, वेलची, बेदाणे साल नावाच्या झाडाच्या पानात ठेवून कोळशाच्या शेगडीत भाजून तयार केला जातो. २० व्या शतकाच्या सुरुवातीला ओडिशातील नयनगढ जिल्ह्यात हा पदार्थ पहिल्यांदा बनवला गेला असं सांगतात. दुर्गा पुजेदरम्यान या पदार्थाला जास्त मागणी असते.

छेन गज

ओडिशातील अतिशय प्रसिद्ध असा हा पदार्थ चीज, साखर आणि शेवयांपासून बनवला जातो. त्यासाठी सर्व घटक व्यवस्थित मिसळून आयताकृती भांड्यात मोल्ड केले जातात व साखरेच्या पाकाचे आवरण त्याला दिले जाते. गजचे दोन प्रकार आहेत, कोरडा व उकळलेला गज आणि तळलेला, पाकातला गज.

छेना झिली

Chhena Jhilli

हा खास गोड पदार्थ तळलेले चीज, वेलची पूड, तूप आणि साखरेच्या पाकापासून बनवला जातो. छेना झिली हा तळलेले पनीर साखरेच्या पाकात बुडवून तयार केला जाणारा पदार्थ आहे. पुरी जिल्ह्यातील निम्पाडा गाव छएन झिलीसाठी प्रसिद्ध आहे. पुरी ते भुवनेश्वर मार्गावर निम्पाडामध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी दुकानांमध्ये छेना झिली विकली जाते.

रसबली

Rasabali

रसबली हा मूळचा केंद्रपाडाचा पदार्थ आहे. हा पदार्थ तळलेला, सपाट, लालसर रंगाची पॅटी यात घट्ट, गोड दुधात बुडवून तयार केलेला असतो. हा पदार्थ इतका मुलायम असतो, की तोंडात घातल्याक्षणी विरघलतो. केंद्रापाडा येथील बैसनभिपांडा दुकानात सर्वोत्कृष्ट रसबळी खायला मिळते.

ओडिशातील गोड पदार्थांची सर्वोत्तम दुकाने

  1. पहाळा स्वीट स्टॉल (भुवनेश्वरमधील बिजू पटनाईक विमानतळापासून १४ किलोमीटर)
  2. निम्पाडा स्वीट स्टॉल (भुवनेश्वरपासून ४० किलोमीटर अंतरावर)
  3. बिकालानंदाकारा शॉप (सहीद नगर, भुवनेश्वर)
  4. दमामहाराज शॉप (नयापाली, भुवनेश्वर आणि लिंक रोड, कटक)
  5. भगन साहू शॉप (कनिका चौक, कटक)

 पर्यटन : अपरिचित ओडिशा
    ओडिशा म्हटले की आपल्याला कोणार्कचे सूर्यमंदिर आणि जगन्नाथपुरी एवढेच माहीत असते. पण त्यापलीकडेदेखील ओडिशात खूप काही बघण्यासारखे आहे आणि ते नितांतसुंदर आहे. ओरिसा हे भारतातील एक सुंदर राज्य आहे जे आकर्षक समुद्र किनारे, निसर्गरम्य मंदिरे, सुंदर पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. जगन्नाथ पुरी मंदिर आणि कोणार्क सूर्य मंदिर ही ओडिशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.मंदिरांचे राज्य म्हणूनसुद्धा त्याची ओळख सांगता येते. रमणीय किनारे, शिल्पसमृद्ध मंदिरे आणि इतिहासाचा वारसा जपणारी धौली, उदयगिरी, खंडगिरीसारखी ठिकाणे, गर्द जंगलात वसलेले कोरापुट, तर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध अशी नंदनकानन, सिमलीपालसारखी अभयारण्ये अशा सर्वच गोष्टींनी संपन्न असलेले हे ओडिशा राज्य. राईस बाउल ऑफ इंडिया अशी प्रौढी मिरवणारा हा प्रदेश. नजर जाईल तिकडे भाताची शेती डोळ्याचे पारणे फेडते.

ओडिशाचा इतिहास इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या-तिसऱ्या शतकापर्यंत मागे जातो. सम्राट अशोक, महान राजा खारवेलपासून ते अगदी गंगवंशीय राजवटीपर्यंतचे पुरावे आणि संदर्भ इथे पाहायला मिळतात. इथे नांदलेल्या राजवटी या संपन्न होत्या, समृद्ध होत्या, विजिगीषू वृत्तीच्या होत्या. आपल्या राज्याच्या सीमा सर्वदूर कशा पसरतील याची जाणीव ठेवूनच त्यांचा कारभार चालत असे. राज्यविस्ताराबरोबरच कला आणि संगीत या क्षेत्रांना मोठे पाठबळ देणारी अशी इथली राजघराणी होती. निसर्गाचा वरदहस्त जसा या भूमीवर आहे तसाच या राजघराण्यांचादेखील वरदहस्त इथल्या प्रजेवर, कलेवर, संस्कृतीवर आजही दिसतो. पुरी-कोणार्क म्हणजेच ओडिशा एवढाच हा प्रदेश संकुचित नसून पर्यटनाच्या दृष्टीने अनेक आश्चर्यकारक गोष्टी इथे आहेत. त्यामुळे भुवनेश्वरपासूनच वेगळ्या गोष्टी पाहायला सुरुवात करावी.
           प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांसाठी तर ओडिशा म्हणजे एक नंदनवन आहे. धौली इथे असलेले अशोकाचे शिलालेख किंवा उदयगिरी-खंडगिरी या जैन लेणी आणि तिथे असलेले राजा खारवेलाचा शिलालेख आवर्जून पाहण्यासारखा आहे. इथे माकडे मात्र खूप असतात आणि खाण्याचे पदार्थ जर हातात असतील तर ते हिसकावून घेतात. अन्यथा या माकडांचा काही उपद्रव नाही. हाथीगुंफा आणि राणीगुंफा या इथल्या खास लेणी आहेत. त्याचबरोबर नागाच्या तोंडाच्या आकाराची नागगुंफासुद्धा मुद्दाम पाहण्याजोगी आहे. इथे प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणची सुंदर माहिती लिहिलेली आहे. ओडिशाला खाण्या-पिण्याचा काही त्रास नाही. सर्व प्रकारचे पदार्थ इथे आता मिळतात. पण भुवनेश्वरमध्ये काही ठिकाणी खास ओडिशा थाळी मिळते ती मुद्दाम चाखून पाहण्याजोगी आहे. सगळीकडे तवा रोटी म्हणजे आपल्या फुलक्यांसारख्या पोळ्या उपलब्ध आहेत. अगदी कोणार्कलासुद्धा असलेल्या हॉटेल्समध्ये आता राजस्थानी, गुजराथी पद्धतीचे जेवण मिळते.  एक सुंदर पदार्थ आवर्जून खावा तो म्हणजे इथे अगदी रस्तोरस्ती मिळणारे दहीवडे! २० रुपयांत ६ उडदाचे वडे त्यावर दही, चिंचगुळाचे पाणी, पिवळ्या वाटाण्याची उसळ, चाट मसाला आणि बटाटय़ाचा रस्सा असे घालून डिश तयार होते. अत्यंत चविष्ट असा हा पदार्थ मुद्दाम खाऊन पाहावा. रस्त्यावर अगदी महामार्गावरसुद्धा सायकलला दोन मोठी तपेली लावलेली दिसतात. त्यात हे दहीवडे विकतात. अनेक माणसे सकाळचा भरपेट नाश्ता म्हणूनसुद्धा हे दहीवडे खातात. कोणार्क-पुरीच्या बाहेरसुद्धा खूप समृद्ध असलेला हा ओडिशा प्रदेश खासकरून पाहण्याजोगा आहे. इथल्या प्रत्येक भागाला स्वत:ची एक ओळख आहे. जसे नुसत्या कटकमध्ये चांदीच्या तारेपासून केलेले फिलीग्रीचे दागिने विकणारी शेकडो दुकाने आहेत. संबळपुरी सिल्क तर जगप्रसिद्ध आहे. महानदीवर बांधलेले हिराकूड धरण. बालासोरचे क्षेपणास्त्र परीक्षण केंद्र आणि कोरापुट, जेपोर, राजगड इथली विपुल वनसंपदा. ओडिशा अगदी सर्वागसुंदर आहे. 

भुवनेश्वर

भुवनेश्वर हि ओडीशाची राजधानी आहे आणि २५०० वर्षांपेक्षा जुना वारसा असलेला परिसर आहे. प्राचीन स्मारके आणि आधुनिक बांधकामांचे यांचे मिश्रण इथे पहायला मिळते. याच शहराला टेम्पल सिटी म्हणजे मंदीराचे शहर असे म्हणले जाते. भुवनेश्वर शहर महानदीच्या काठावर वसले आहे.असे मानले जाते की भुवनेश्वरमध्ये पूर्वी २००० हून अधिक मंदिरे होती. त्यापैकी बरेच मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केले, परंतु कृतज्ञतापूर्वक, लिंगराजा मंदिरासारखे काही महत्त्वाची मंदिरे अजूनही उभी आहेत. हे मंदिर कलिंग शैलीत बांधले गेले आहे.भुवनेश्वर, पुरी आणि कोणार्क हा पर्यटकांच्या दृष्टीने सुवर्ण त्रिकोण मानला जातो.
भुवनेश्वर, कलिंग के पूर्व प्रांत की प्राचीन राजधानी शिशुपालगढ़ के अवशेषों के पास स्थित है।
                 कलिंग देशाची आधीची राजधानी शिशुपालगड जवळच भुवनेश्वर वसले आहे.भुवनेश्वरजवळच धौली हे ठिकाण आहे, जिथे इ.स.पुर्व २६१-२६२ दरम्यान मौर्य सम्राट अशोकने कलिंग देशावर आक्रमण केले होते. भुवनेश्वरजवळच सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला आहे. मौर्य साम्राज्याचे पतन झाल्यावर हा परिसर  महामेघवाहन वंशाच्या ताब्यात आला.याच वंशातील राजा खारवेल हा प्रसिध्द आहे.यांचा शिलालेख भुवनेश्वरजवळील दयगिरि आणि खंडगिरी लेण्यातील हातीगुंफेत आहे.यानंतर या परिसरावर सातवाहन, गुप्त, मठर आणि शैलोद्भव यांचे शासन आले. यानंतर या भागावर सातव्या शतकात सोमवंशी किंवा केशरी वंशाची सत्ता होती. पुढे १४ व्या शतकापर्यंत या परिसरावर गंग वंशाची राज्य होते.त्यांची राजधानी भुवनेश्वरजवळ कलिंगनगर येथे होती.याच्यानंतर भोइ वंशाच्या मुकुंद देव ते मराठ्यांची सत्ता प्रामुख्याने या राज्यावर राहीली. भुवनेश्वर परिसरावर शैव पंथाचा प्रभाव असल्यामुळे आठव्या ते बाराव्या शतकाच्या कालावधीत इथे मोठ्या प्रमाणात शिवमंदीर उभारली गेली. भुवनेश्वरमध्ये अनंत वासुदेव हे एकमेव प्राचीन विष्णु मंदीर आहे.
इ.स. १५६८ मध्ये अफगाणी वंशाच्या करराणी घराण्याने भुवनेश्वरपरिसराचा ताबा घेतला.यांच्याच कारकीर्दित अनेक प्राचीन मंदीरांचा विनाश केला गेला. सोळाव्या शतकात इथे मोघल राजवटीने पाय रोवले तर पुढे अठराव्या शतकात इथे मराठी साम्राज्याची सत्ता प्रस्थापित झाली.पुढे मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली आणि १८०३ मध्ये इंग्रजांनी इथे पाउल रोवले.१९१२ ला बंगाल तर १९१२ ते १९३६ दरम्यान बिहार व ओरिसा प्रांत असा भाग होता.ब्रिटीश काळात ओरिसाची राजधानी कटक होती.मात्र इथे सतत पुराचा धोका असायचा तसेच जागाही अपुरी होती. त्यामुळे ३० सप्टेंबर १९४६ मध्ये राजधानी नवीन जागी हलवावी असा प्रस्ताव ओरिसा विधानसभेत मांडला गेला. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर १३ एप्रिल १९४८ मध्ये पंतप्रधान नेहरुंनी नव्या राजधानीची कोनशीला उभारली. नव्या राजधानीचे नाव लिंगराज मंदिराचे अधीपती त्रिभुवनेश्वर म्हणजे तिन्ही लोकांचे परमेश्वर या अर्थाने भुवनेश्वर ठेवले गेले.सन १९४९ मध्ये कटकमधून विधानसभा भुवनेश्वरला हलवली गेली.यानंतर आधुनिक भुवनेश्वरची उभारणी जर्मन वास्तुकार ओटो कोनिग्सबर्गर यानी केली,पुढे भुवनेश्वर खुपच वेगाने विकसित झाले.
   भुवनेश्वर हे मंदिरांचे शहर म्हणून अगदी प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. ओडिशा स्थापत्य शैलीतील संक्रमणाची स्थिती दाखवणारी आणि त्या कलेमध्ये बांधलेली मजबूत आणि अत्यंत दिमाखदार मंदिरे या ठिकाणी पाहता येतात. लिंगराज मंदिर म्हणजे या सगळ्याचा मेरुमणी आहे. भव्यदिव्य असे हे मंदिर आपल्याला लांबूनसुद्धा दिसते. त्याला लागूनच असलेले भले मोठ्ठे तळे या परिसराची शोभा अजूनच वाढवते. अत्यंत सुंदर मूर्तिकला आणि ओडिशा स्थापत्याचा एक अजोड नमुना म्हणून हे मंदिर जरूर पाहावे. या मंदिर परिसरात अनेक लहान-मोठी मंदिरे पाहायला मिळतात. मात्र गाभाऱ्यात असलेली शिविपड ही नोटांनी झाकून गेलेली दिसते. असंख्य नोटांनी मढवलेली शिविपड आणि आशाळभूतपणे आपल्याकडे पाहणारे पंडे अगदी अंगावर शिसारी आणतात. पण एवढे एक सोडले तर खूपच भव्य आणि देखणे मंदिर पाहण्याचे भाग्य आपल्याला इथे लाभते. अभ्यासकांसाठी तर हे मंदिर म्हणजे पर्वणीच आहे परंतु सामान्यजनांनीसुद्धा मुद्दाम इथे थांबून या मंदिरावर शिल्पांकित केलेली अनेक शिल्पे मनसोक्त पाहून घ्यावीत. या मंदिराच्या परिसरात अगदी चालत फिरता येतील अशी बरीच मंदिरे एकामागे एक अशी उभी आहेत. ज्यात अनंत वासुदेव मंदिर, केदारेश्वर मंदिर, वेताळ मंदिर अशी काही नावे घेता येतील. परशुरामेश्वर मंदिर आणि त्याला लागूनच असलेले मुक्तेश्वर मंदिर हे अत्यंत देखणे आणि अत्यंत सुंदर असे म्हणावे लागेल. अगदी टुमदार असलेल्या या मुक्तेश्वर मंदिरासमोर एक दगडी कमान आहे ज्यातून आपला या परिसरात प्रवेश होतो. मंदिर छोटेखानी आहे पण त्यावरील शिल्पकाम अप्रतिम आहे. प्रदक्षिणा मारताना मंदिरावर काही ठिकाणी एक खिडकी आणि त्यातून डोकावणारी एक स्त्री दाखवली आहे. तिच्या खिडकीवर कावळ्यासारखा पक्षी दाखवला आहे. ते पाहून ‘पल तो गे काऊ कोकताहे.. शकून गे माये सांगताहे..’ याचा काही संदर्भ असेल का, असे उगीचच वाटते. मंदिर पाहायला आलेल्या लोकांमध्ये आपल्या माहेरचे कोणी आले असेल आणि म्हणून तो कावळा ओरडतोय हे बघायला ती स्त्री बाहेर डोकावत असेल का? कल्पनेला खूप वाव आहे. पण हे मंदिर मात्र अगदी सुंदर आहे. प्रत्येक प्रदेशाला एक समृद्ध भाषा असते आणि त्या भाषेची काही वैशिष्टय़े असतात. ओडिशामध्ये कळसाला देऊळ असा शब्द आहे आणि सभामंडपाला जगमोहन. मुख्य गर्भगृहावर असलेल्या कळसाला रेखा देऊळ म्हणतात, तर जगमोहनावर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात. खूप वेगळी आणि आकर्षक अशी ही नावे वाटतात.
        भुवनेश्वरमधील काही महत्वाची मंदीर म्हणजे लिंगराज मंदिर, राजरानी मंदिर, केदार गौरी मंदिर, अनंत बासुदेव मंदिर, चिन्तामणिस्वर मंदिर, इस्कॉन मंदिर आणि मुक्तेश्वर मंदिर. यापैकी लिंगराज आणि अंनत वासुदेव मंदीर येथील महाप्रसाद महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. येथील इतर पर्यटन स्थळ म्हणजे राज्य संग्रहालय, बिंदु सरोवर आणि नंदनकानन झु, चंदका वन्यजीव अभ्यारण्य आणि तेथील गरम पाण्याचे झरे. पर्यावरण प्रेमीसाठी इथे बरीच उद्याने आहेत.त्यात बीजू पटनायक पार्क, बुद्ध जयंती पार्क, आईजी पार्क, फॉरेस्ट पार्क, गांधी पार्क, एकाम्र कानन, आईएमएफए पार्क, खारावेला पार्क, एसपी मुखर्जी पार्क, नेताजी सुभाष चंद्र बोस पार्क हि प्रमुख उद्याने आहेत. विज्ञान प्रेमी पर्यटकांसाठी रीजनल सायन्स सेंटर, पठानी सामंत तारांगण आहे.लहान मुलांसाठी नंदनकानन प्राणीसंग्रहालय आहे. याशिवाय पीपली गाव, देरास बांध, बाया बाबा मठ, शिशुपालगढ़, बीडीए निक्को पार्क, फॉर्चून सिटी, इंफो सिटी अशी बरीच आकर्षणे आहेत.
    भुवनेश्वर हे शहराचे नामकरण होण्यासाठी मुख्य कारण म्हणजे इथे असणारा भगवान शंकराच्या वास्तव्याचा प्रभाव !या नावाची उत्पत्ती त्रिभुवनेश्वरपासून झाली असे मानले जाते.संपुर्ण शहरात आपल्याला शिवमंदीर नाही असे क्वचितच बघायला मिळेल. प्रमुख शिवमंदीरात अष्टसंभू मंदिर, भृंगेश्वर शिव मंदिर, गोकर्णेश्वर शिव मंदिर, गोसागरेश्वर शिव मंदिर, जालेश्वर शिव मंदिर, कपिलेश्वर शिव मंदिर, सर्वत्रेश्वर शिव मंदिर, शिवतीर्थ मठ, स्वपनेश्वर शिव मंदिर, उत्तरेश्वर शिव मंदिर और यमेश्वर मंदिर
आहेत. भुवनेश्वरमधील प्राचीन मंदीरात  ऐसनयेश्वर शिव मंदिर, अष्टसंभू मंदिर, भृंगेश्वर शिव मंदिर, भारती मठ मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, भ्रुकुटेश्वर शिव मंदिर, बयामोकेश्वर मंदिर, भस्कारेश्वर मंदिर, चंपाकेश्वर चंद्रशेखर महादेव मंदिर, चक्रेश्वरी शिव मंदिर और दिशिश्वर शिव मंदिर हि मंदीर आहेत. इतर मंदीरात चिंतामनीश्वर शिव मंदिर, गंगेश्वर शिव मंदिर, गोकरनेश्वर शिव मंदिर, जालेश्वर शिव मंदिर, कपिलेश्वर शिव मंदिर, लबेश्वर शिव मंदिर, लखेश्वर शिव मंदिर, मदनेश्वर शिव मंदिर, मंगलेश्वर शिव मंदिर, नागेश्वर मंदिर, पुव्रेश्वर शिव मंदिर, सर्वत्रेश्वर शिव मंदिर, शिवतीर्थ मठ, गोसागरेश्वर शिव मंदिर, सुबरनेश्वर शिव मंदिर, सुकुतेश्वर मंदिर, स्वपनेश्वर शिव मंदिर और यमेश्वर मंदिर .मात्र शिवमंदीर सोडून इतर देवतांची मंदीर भुवनेश्वर शहरात आहेत. त्यामध्ये भगवान कृष्ण आणि देवी चंडी  मंदिर प्रसिध्द आहे.याखेरीज अतंता वासुदेव मंदिर, अखड़चंडी मंदिर, ब्राह्मा मंदिर, देवसभा मंदिर, दुलादेवी मंदिर, कैंची मंदिर, विष्णु मंदिर, गोपाल तीर्थ मठ, जनपथ राम मंदिर, रामेश्वर डुला, सुका मंदिर, वैताल डुला आणि विष्णु मंदिर प्रसिद्ध आहेत.
            इथे तुम्ही रिक्षा घेऊन फिरणे अगदी सोयीस्कर. सगळी मंदिरे एकमेकांच्या जवळजवळ अशीच आहेत. ओल्ड टाऊन नावाचा जो भाग आहे तिथेच ही प्राचीन मंदिरे पाहता येतील.   
          इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, याचे नामकरण बिजु पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ असे केले आहे. भुवनेश्वरमध्ये मुक्कामासाठी ५-स्टार होटेल, ३-स्टार होटेल, बजेट होटल्स आणि  लॉजिंग मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर भटकंतीसाठी शहरात कॅब, ऑटो रिक्शा, सिटी बस उपलब्ध आहेत. तसेच जेवणासाठी भरपुर पर्याय उपलब्ध आहेत.
भुवनेश्वर येथे साजरे केले जाणारे सण :-
   मंदिर कार महोत्सव, रथ-यात्रा, शिवरात्रि, दिवाळी, गणेश पूजन, नुआखाई आणि सरस्वती पूजा, ईद, क्रिसमस, आदिवासी मेला, तोशाली राष्ट्रीय शिल्प मेला, राजधानी पुस्तक मेला आणि खंडगिरी उत्सव
स्मारक
   भास्करेश्वर मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, कपिलेश्वर महादेव मंदिर, लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, ओबेरॉय होटल, परशुरामेश्वर मंदिर, राजारानी मंदिर, रामेश्वर मंदिर, बैताल देउल (मंदिर)
विशेस। आकर्षण :-
    लिंगराज मंदिर, नंदनकानन जूलॉजिकल पार्क, उदयगिरि आणि खंडगिरी गुफाएं, धौली, राजारानी मंदिर इत्यादी
खरेदीसाठी :-
   बापूजी नगर, यूनिट 2 आणि 3 बाजार, अशोक नगर, जनपथ , कटक-पुरी रोड, शहीद नगर, सत्य नगर
भुवनेश्वर मध्ये खरेदीसाठी भरपुर पर्याय उपलब्ध आहेत. इथे आपल्याला सहलीचे स्मरण म्हणून वस्तु खरेदी करायची असेल किंवा सजावटीच्या वस्तु घ्यायच्या असतील तर सर्वप्रकारच्या वस्तु इथल्या बाजारात उपलब्ध आहेत. इथे अ‍ॅप्लीक वर्क, हँडबॅग, छत्र्या, दागिने मिळतात. लाकडी वस्तु, धातुच्या वस्तु, विणलेल्या वस्तु ज्या ओडीशाची ओळख मानल्या जातात. हे सर्व भुवनेश्वर भेटीत घ्यायलाच हवे.भुवनेश्वर शहरात एकाम्र-हाट : क्राफ्ट मार्केट : अत्यंत दर्जेदार कलाकुसरीच्या वस्तू मिळण्याची जागा. सरकारने इथल्या ग्रामीण-शहरी-वनवासी सगळ्याच कलाकारांना उत्तम बाजारपेठ इथे बनवून दिली आहे. ओडिशाचे ताड-पत्रावरील कोरीव काम, पिपलीचे रंगीत कापडी कंदील, वारली सारखी सावरा आदिवासी चित्रकला, ढोकरा पितळी दिवे व मुर्त्या, अद्वितीय कलाकुसरीच्या रेशमी बोम्बकाई, बिचित्रपुरी व पसापाल्ली साड्या, संबळपूर सिल्क आणि सुती साड्या, टसर रेशीम व साध्या रेशमाची सुरेख जरीकाठी सोवळी, संगमरवरी दगडातील कोरीव मूर्ती व डबे हे विशेष उल्लेखनीय. येथील मूर्तिकला फार विशेष आहे, शहराच्या आसपास अनेक शिल्पशाला असून उच्च दर्जाची आणि त्या तोलाची किंमत असणारी सुरेख शिल्पे लाईफ साईज आकारापर्यंत मिळतात, वाहतूक आणि किंमत जमत असेल तर जरूर जाऊन घेण्याइतकी विशेष.
हॉटेल:-
   जिंजर हॉटेल, द क्राउन, हॉटेल ग्रांड सेंट्रल, हॉटेल आर्य पैलेस, हॉटेल पुष्पक, हॉटेल स्वास्ती, हॉटेल एक्सेलेन्शन भुवनेश्वर, एम्पर्स हॉटेल, द न्यू मैरियन, द रॉयल मिडटाउन इत्यादी
भेट देण्यासाठी योग्य काळः-
 ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा भुवनेश्वर इथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. 
ओड़ीशा स्टेट म्यूजियम :-
प्रोफेसर घनश्याम दास आणि प्रोफेसर एन.सी. बनर्जी या दोन प्राध्यापक इतिहासकार यांच्या प्रयत्नाने ओडीशा स्टेट म्युझियमची उभारणी झाली. सन १९३२ पासून इथे वस्तुंचा संग्रह करण्यास सुरवात झाली. इ.स. १९४७-४८ मध्ये हे संग्रहालय कटकमधून भुवनेश्वरला हलविले गेले.त्यावेळी याचे नाव प्रांतीय म्युझीयम होते.पुढे १९६० मध्ये याचे नाव बदलून स्टेट म्युझीयम ठेवले गेले.१९३८ मध्ये ओडीशा राज्य सरकारने या संग्रहलयाला ताब्यात घेतले. पुढे हे संग्रहालय खुप लोकप्रिय झाले. सध्या इथे दुर्मिळ चित्र्,शिल्प, टेराकोटा वस्तु, तांब्याची भांडी, आणि अश्या बर्‍याच वस्तु बघायला मिळतात. तसेच इथे काही दुर्मिळ नाणी आहेत.स्टेट म्यूझियम

भुवनेश्वरमध्ये आतापर्यंत दिसलेली घाण बकालपणा याचा मागमूस कुठे नाही. वाटले नंदनवनातच आलो.
म्यूझियमचे देखणे आवार

  संग्रहालयाला प्रशस्त, विस्तीर्ण आवार आहे. आवारात विविध आकारांच्या चौकटीत सीमित केलेली, सुरेख राखलेली हिरवळ आणि व्यवस्थित कातरलेली झाडे दिसतात.
व्यवस्थित राखल्यामुळे आवाराचा प्रचंड विस्तार अंगावर येत नाही. मुख्य बाब म्हणजे जमीन उगीचच सपाट करून त्यावर हिरवळ वाढवली नव्हती. जमिनीतले मूळचे नैसर्गिक उंचवटे तस्सेच ठेवून हिरवळीचा साज त्यावर चढवला आहे.
म्यूझियमच्या आवारात

देखणी शिल्पे

देखणी शिल्पे

अधूनमधून आकर्षक शिल्पे आणि पुतळे.

देखणे आवार

देखणी शिल्पे

संग्रहालयाचे प्रथमदर्शन आकर्षक आहे. संग्रहालयाच्या आतली सजावट कलापूर्ण दिसते. स्वागत दालनात उत्सवी भडकपणाचा चमकदार स्पर्श असलेली सजावट.
स्वागतक्षाची सजावट

ही सर्वव्यापी श्रीकृष्ण, बालभद्र आणि सुभद्रा यांची त्रिमूर्ती आणि त्यांचे ते ओदिशी शैलीतले वैशिष्ट्यपूर्ण टप्पोरे डोळे.
सर्वव्यापी त्रिमूर्ती आणि टप्पोरे डोळे

आतली मांडणीही सुबक. जमीन, भिंती, काचा, खिडक्यांची स्वच्छता चकाचक. रंगसफेती नीटस आणि आकर्षक. काचखिडक्यात वस्तू टापटीपीने व्यवस्थित मांडलेल्या. उडिया, देवनागरी आणि इंग्रजीत पाट्या लिहिलेल्या आहेत.






काचघर

प्रकाशचित्रणाला प्रतिबंध नसल्यामुळे मनसोक्त फोटो काढता येतात.
काचघर

संग्रहालयाच्या आतल्या खिडकीतून दिसणारी संग्रहालयाची नीटनेटकी इमारत
इमारत आतून

इमारत आतून

इमारत आतून

काचघर

लिपीचा विकास

एके ठिकाणी उडिया लिपी प्राचीन लिपीवरून कसकशी विकसित झाली ते दाखवले आहे.  ब्रह्मी लिपी उडियाशी फारच मिळतीजुळती वाटली. यांगूनच्या एखाद्या दुकानाची पाटी भुवनेश्वरच्या बाजारात लावली तर आपल्याला कळणार देखील नाही.आदिवासी

आदिवासी

आदिवासी

आदिवासी

आदिवासी

ओदिशातील विविध आदिवासी जमातींच्या जीवनशैलीचे दर्शन घडवून माहिती देणारी काचघरे आहेत.

कारंजे

कारंज्याने सजीव केलेले वातावरण

रीजनल म्युझियम ऑफ़ नॅचरल हिस्टरी :-

  भुवनेश्वरला गेल्यावर नक्की भेट द्यावी, असं हे म्युझियम आहे. 
प्रादेशिक निसर्ग संग्रहालय
 निसर्ग संग्रहालय
गेंदेदार झेंडू
प्रवेशद्वार
 या संग्रहालयाचा परिसरही उत्तम राखला आहे. सोनटक्क्यासारखा दिसणारा पण जास्त मोठा आणि जास्त मोहक हेलिकोनिया.हिरवळ, सुंदर झाडे, शिल्पे वगैरेंच्या जोडीला टेनिस चेंडूएवढ्या मोठ्या आकाराचे मोठ्ठे झेंडू ठिकठिकाणी फुललेले. झुळझुळणार्‍या वार्‍याने त्या सजीव वातावरण यामुळे उत्साह भरतो.
देखणे आवार
देखणे आवार
देखणे आवार
देखण्या आवारात
प्रवेशद्वारातून

प्रवेश केल्याबरोबर समोर हत्तीचा हाडांचा सापळा ठेवला आहे.
हत्तीचा सांगाडा

खर्या ह्त्तीचा, देवमाशाचा सांगाडा इथे पहायला मिळतो. विविध प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींबद्दल भरपूर माहिती देणारं असं हे संग्रहालय आहे. विशेषतः ज्या हत्तीचा सांगाडा आहे, त्या शंकरची कहाणी चटका लावून जाते.
IMG-20181226-WA0006.jpg
हा शंकर नावाचा हत्ती ओडिसामध्ये गावात शिरून त्रास देऊ लागला, दोन माणसांचा मृत्यूही ओढवला, फॉरेस्ट खात्याने त्याला पकडून ठेवलं होतं. पुढे त्याला काही इन्फेक्शन होऊन तो मेला. नंतर त्याचे शवविच्छेदन करताना खूप पूर्वी त्याला लागलेली बंदुकीची गोळी हाडात अडकून बसलेली दिसली. शंकरच्या हिंसक वृत्तीचे कारण म्हणजे हा बंदुकीचा हल्ला असू शकतो. आजही त्याच्या हाडांच्या सापळ्यात ती गोळी दिसते. 
IMG-20181226-WA0007.jpg
देवमाशाचा सांगाडा
काचघर


सापळ्यांचे युगुल

मोर

जंगलचा राजा

जगातले सर्वात मोठे अंडे
टिप्पणीची गरज आहे?

पक्षी आणि त्यांची अंडी

गवा

नंदनकानन प्राणीसंग्रहालय

प्राणीसंग्रहालय म्हटल्यावर नाके मुरडली जातात. मरतुकडे आणि गलितगात्र झालेले प्राणी असे चित्र डोळ्यांसमोर येते. पण नंदनकानन मात्र फार फार वेगळे आहे बरे का. खूप छान राखलेले आणि प्राण्यांसाठी मोठा परिसर आणि मोकळी हवा असलेले हे नंदनकानन प्राणीसंग्रहालय भुवनेश्वरपासून फक्त १८ कि.मी वर आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे उघडे असते. इथे आत फिरण्यासाठी सफारी आहेत. माणशी ५० रुपये असा सफारीचा दर असून अंदाज १ तासाची फेरी मारून आणतात. पांढरा वाघ, सिंह, पट्टेरी वाघ, अस्वले, हरीण, चितळ, सांबर, जिराफ, झेब्रा असे अनेक प्राणी आपल्याला खूप जवळून पाहता येतात. इथे आपण बसमध्ये आणि प्राणी उघडय़ावर असे असल्यामुळे मोकळेपणाने वावरणारे प्राणी पाहता येतात. अस्वले तर पुढचे दोन पाय गाडीला टेकवून आत डोकावून पाहतात. फारच भारी वाटते हे पाहायला. 





























   शक्यतो दुपारी ३ वाजता जर इथे गेले तर खूप प्राणी पाहता येतात. कारण ही प्राण्यांना खाणे देण्याची वेळ असते. त्यामुळे इथे प्राण्यांचा वावर खूप मोठय़ा प्रमाणावर असतो. तसेच विविध देशांतून येणारे स्थलांतरित पक्षी इथे दिसतात. खूप मोठय़ा संख्येने मोर इथे आहेत. आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे एक छोटेसे दालन इथे केलेले असल्यामुळे त्यांचे दर्शनसुद्धा जवळून आणि नीट होते.
   नंदनकानन झु आणि बोटॅनिकल पार्क ४०० हेक्टरमध्ये पसरले आहे. हे प्राणीसंग्रहालय १९७९ मध्ये जनतेसाठी खुले करण्यात आले.भुवनेश्वरमधील हे एक पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. जर आपण सहकुटुंब भुवनेश्वरला भेट देणार असाल तर इथे जायलाच हवे. चंदका -दंपारा अभयारण्याच्या आणि कंजिया सरोवराच्या परिसरात वसलेल्या या प्राणीसंग्रहालयाचे नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे आहे. इथे १२६ प्रकारचे वन्यजीव आणि काही दुर्मिळ वृक्षसंपदा पहायला मिळते. 
नेताजी सुभाष चंद्र बोस पार्क :-
भारतभुमीचे महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे उद्यान उभारले आहे.भुवनेश्वरमधील हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे

.हे उद्यान खुपच उत्तमरित्या राखलेले आहे.चालण्यासाठी पथ, प्रकाशव्यवस्था, जॉगिंग ट्रॅक आणि कारंजे यामुळे येथील शोभा वाढलेली आहे,पर्यटकांना बसण्यासाठी खुप बेंचची व्यवस्था केलेली आहे.इथेली नयनरम्य हिरवळ आणि ताजी हवा यामुळे इथे आलेली व्यक्ती खुपवेळ उद्यानात घालवते.आरामात छान वेळ घालवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात स्थानिक व्यक्ती व पर्यटक येतात. तसेच इथल्या खेळण्यामुळे मुलही इथे रमतात. सकाळी ५ ते ८ व संध्याकाळी ४ ते रात्रॉ ८ अशी या उद्यानाची वेळ आहे.

बिजु पटनायक पार्क
बिजु पटनायक पार्क हे भुवनेश्वरमधील सुंदर बाग आहे.हे उद्यान बेरहामपुरमधील संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या जवळच आहे.ब्रिटीश सराकरचे डीएफआईडी ऑफिस याला लागूनच आहे.हे उद्यान ओरिसाचे माजी मुख्यमंत्री बिजु पटनायक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारले आहे.हे उद्यान जवळपास सात एकरमध्ये पसरले आहे.इथे बोटींगची सोयही आहे.इथे एक म्युझिकल फाउंटनदेखील आहे.
बुध्द जयंती पार्क
 
गौतम बुह्दच्या विचारांना समर्पित केलेले हे पार्क आहे.कलिंगच्या युध्दानंतर ओडीशाच्या इतिहासात एक नव्या युगाची सुरवात झाली. हिंसेला कंटाळलेल्या लोकांना गौतम बुध्दाच्या विचारांचे आकर्षण वाटू लागले. या विचारांना आणखी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी भुवनेश्वर विकास प्राधिकरणाने या उद्यानाची निर्मिती केली. चंद्रशेखरपुरमध्ये ४४ एकर जागेत हे उद्यान आहे. हे उद्यान एका चौथर्यावर उभा केलेले आहे आणि याच्या एका बाजुला चंदकाचे अभयारण्य आहे. इथे वृक्षवल्लींच्या छायेत आपण निवांत बसून पक्ष्यांचे कुजन एकु शकता.
इंदीरा गांधी पार्क 
इंदीरा पार्क म्हणजेच आय.जी. पार्क हे भुवनेश्वरमधील आणखी एक सुंदर बाग. ११ एकरात पसरलेल्या हे उद्यान पर्यटकांचे आकर्षण आहे.हे उद्यान भुवनेश्वरमधील ए.जी. चौकाजवळ आहे.या बागेच्या मागेच ओडीशाचे सचिवालय आणि विधानसभा आहेत.याआधी हे पार्क म्हणजे मैदान होते.इथे परेड आयोजित केली जाई. पुढे सर्वसामान्य जनतेसाठी इथे पार्कची उभारणी झाली. या पार्कला एतिहासिक महत्व आहे.याच ठिकाणी ३० ऑक्टॉबर १९८४ ला स्वर्गीय श्रीमती इंदीरा गांधीची पंतप्रधान म्हणून शेवटची सभा झाली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे एक पुतळा उभा करण्यात आला आहे. इथे आपण वर्षभर भेर्‍ देउ शकतो.
फॉरेस्ट पार्क
भुवनेश्वरमधील आकर्षक उद्यानापैकी एक म्हणजे फॉरेस्ट पार्क. हि बाग कॅपिटल हॉस्पिटलजवळ आहे.इथे स्थानिक लोक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात.इथे खेलण्यासाठी मोठे मैदान, बरीच वृक्ष्संपदा आहे. तसेच हिरवळचे पट्टे आहेत.त्यामुळे सकाळी फेरफटका मारण्यासाठी किंवा जॉगिंगसाठी हि आदर्श जागा म्हणता येईल. मुलांना खेळण्यासाठी हे उद्यान हा उत्तम पर्याय आहे.
जनजातीय कला और शिल्पकृति संग्रहालय
  या संग्रहालयाला जनजातीय संग्रहालय असेही नाव आहे. हे संग्रहालय भुवनेश्वर रेल्वे स्टेशनपासून जवळपास ३ कि.मी. लांब आहे. इथे आपल्याला ओडीशातील आदिवासी लोकांचे जीवन, संस्कृती याची ओळख होते. यालाच जनजातीय शोध संस्थान संग्रहालय या नावाने देखील ओळखले जाते. या संग्रहालयातील संशोधन केंद्रात आदिवासी लोकांसदर्भात माहिती गोळा केली जाते. आणि या संशोधनाचे निष्कर्श इथे दाखवले जातात. ओडीशामध्ये जवळपास आदिवासींच्या साठ जमाती आहेत. या संग्रहालयात लाकडी मुर्ती, धातुच्या वस्तु, वस्त्रप्रावरण आणि दागिन्याचा मोठा संग्रह आहे. तसेच इथे एक छोटा झु आणि लायब्ररी आहे.सकाळी १० ते संध्याकाळी ५ अशी याची वेळ आहे.इथे फोटोग्राफीला मात्र परवानगी नाही.
खारवेल पार्क
खारवेला पार्क हे भुवनेश्वरमधील एक उत्कृष्ट उद्यान आहे. इथे जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी बाक, प्रशस्त हिरवळ अश्या सुविधा आहेत.इथे मोठ्या प्रमाणात लोक भेट देत असल्यामुळे हे उद्यान अतिशय स्वच्छ ठेवले आहे आणि सोयीही उत्तम आहेत. इथे असलेली वनराई, ओढा, कारंजे, तलाव यामुळे या पार्कला शोभा आलेली आहे. भुवनेश्वर शहराची भटकंती करताना कंटाळ्यास इथे येउन थोडा वेळ विश्रांती घ्यायला हरकत नाही. बहुतेकदा सकाळी आणि संध्याकाळी इथे गर्दी असते. भुवनेश्वर विकास प्राधिकरण (बीडीए) या बागेची छान निगा ठेवतात. आम जनतेसाठी हे उद्यान सकाळी ५ ते ८ व संध्याकाळी ४ ते ८ पर्यंत खुले असते.

एसपी मुखर्जी पार्क
भुवनेश्वरमधील आणखी एक सुंदर उद्यान म्हणजे एसपी मुखर्जी पार्क. इथे जॉगिंग ट्रॅक, चालण्यासाठी पथ, फुलांचे ताटवे यामु़ळे हे आकर्षक ठिकाण आहे. सकाळी ५ ते ८ व संध्याकाळी ४ ते रात्री ८ अशी या बागेत प्रवेश करण्याची वेळ आहे.
बीडीए निक्को पार्क :-
  भुवनेश्वरमधील हे एक अम्युझमेंट पार्क आहे. याची उभारणी १९९७ मध्ये झली. हे एका प्रशस्त जागेत उभारले आहे. इथे एक कृत्रिम सरोवर पहायला मिळते. इथे अनेक खेळ व राईड उपलब्ध आहेत. सहकुटूंब पुर्ण एक दिवस निवांत घालवता येईल अशी जागा म्हणजे हे पार्क.
गांधी पार्क:-
   हे उद्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित आहे. या उद्यानाची उभारणी भुवनेश्वर विकास प्राधिकरणाने केली आहे. हि बाग सवोस्टी प्लाजा जवळ आहे. इथे महात्मा गांधींची प्रार्थनेच्या मुद्रेतील पुतळा आहे. याशीवाय जॉगिंगसाठी, मोकळ्या हवेसाठी आणि काही न करता निवांत बसण्यासाठी हि एक आदर्श जागा आहे. आधी याठिकाणी जनता मैदान नावाचे एक मैदान होते. त्याजागी या उद्यानाची उभारणी केली आहे.
आईएमएफए पार्क :-
  भुवनेश्वरमधील आणखी एक देखणे उद्यान म्हणजे आईएमएफए पार्क. हे उद्यान भुवनेश्वरच्या शहीदनगर परिसरात आहे. इथे भरपुर झाडी, फिरण्यासाठी प्रशस्त आवार, खेळण्यासाठी सोयी आहे.यात बास्केटबाल कोर्ट आहे.तसेच जॉगिंग आणि वॉकिंग साठी ट्रॅक आहेत.
इस्कॉन मंदीर :-
   हे मंदीर भुवनेश्बर शहराच्या मधोमध उभारले आहे.जगभर पसरलेल्या इस्कॉन मंदिराच्या मालिकेतील हे एक मंदिर. या मंदिररात कृष्ण, बलराम, जगन्नाथ, गौरा नेताई आणि सुभद्रा यांच्या मुर्ती आहेत. इस्कॉन पंथाची भुवनेश्वरमध्ये दोन केंद्रे आहेत. एक शहरात स्वर्ग धारा क्षेत्रात आहे, तर दुसरे शहराच्या बाहेर आहे.इस्कॉन मंदिरात रोज भाविकांची प्रचंड गर्दी असते. विशेषतः कृष्ण आणि जगन्नाथ यांच्या उत्सव काळात अधिक गर्दी असते. इथे रोज भजन आणि पुजा होते. मंदिर परिसराची स्वच्छता आणि वातावरण अतिशय उत्तमरित्या राखले जाते,.



शिशुपालगडः-
   हा एक प्राचीन किल्ला आहे.मात्र सध्या इथे फक्त भग्नावशेष बघायला मिळतात. हा भारतातील सर्वात मोठा किल्ला असल्याचा स्थानिकांना विश्वास आहे.याची आता उत्तम देखभाल केली जाते,शिह्सुपालगडाचे जुने अवशेष भुवनेश्वर शहराच्या जवळच पहायला मिळतात. ते बघण्यासाठी इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. इथेले भग्नावशेष बघून हा मुळ स्चरुपात कसा असेल ? याची आज फक्त कल्पनाच करु शकतो. आता हा परिसर संरक्षित स्मारक आहे.

भारताच्या ओडिशा राज्यातील एक प्राचीन स्थळ. ते भुवनेश्वर या राजधानीपासून ९ किमी. अंतरावर आहे. गंगावती नदीने वेढलेल्या या तटबंदीयुक्त नगराचा आकार १.१ चौ. किमी. इतका असून, प्रत्येक दिशेस दोन-दोन अशी एकूण ८ भक्कम प्रवेशद्वारे आहेत. या शहराच्या तटबंदीची बाहेरून उंची ९ मी. इतकी आहे.

शिशुपालगड येथील उत्खनन (१९४८).

या स्थळाचे उत्खनन सन १९४८-४९ साली बी. बी. लाल यांनी केले होते. सदर उत्खनन भारतातील स्वातंत्र्यानंतरचे पहिले मोठे उत्खनन होते. लाल यांनी पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वाराचे आणि लगतच्या परिसरात उत्खनन केले, त्यात त्यांना विविध रंगाची मृद्भांडी, भाजलेल्या मातीच्या मूर्ती, धातूची नाणी आणि इतर पुरावशेष प्राप्त झाले. सदर पुरास्थळाचा काळ त्यांनी इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. चौथे शतक असा निश्चित केला.

या पुरास्थळाचे पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक महत्त्व, आंतरिक स्थापत्य, तत्कालीन नगरवासियांची जीवनपद्धती, घरांची रचना आणि स्थळाचा कालानुक्रमिक विकास इत्यादी बाबी जाणून घेण्याच्या दृष्टीने येथे पुरातत्त्व विभाग, डेक्कन कॉलेज पुण्याचे रबिन्द्र कुमार मोहंती आणि कॉटसेन पुरातत्त्वीय संस्था आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ (लॉस अँजेल्स, अमेरिका) येथील मोनिका स्मिथ यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा उत्खननकार्य हाती घेण्यात आले (२००५-०९). तत्पूर्वी तटबंदीयुक्त शहराचा विशाल आकार आणि तत्कालीन सुनियोजित यंत्रणा लक्षात येण्याकरिता येथे विस्तृत भौगोलिक सर्वेक्षण करण्यात आले (२००२-०५). सदर उत्खनन हे तटबंदीच्या आत पश्चिमेकडे, पूर्वेकडील तटबंदीच्या वर, स्तंभ असलेल्या परिसरात, उत्तरी प्रवेशद्वार व लगतच्या परिसरात आणि तटबंदीच्या बाहेर करण्यात आले. उत्खननात प्राप्त पुराव्यांनुसार आणि कालमापन तिथीनुसार या स्थळाची प्राचीनता इ. स. पू. सहाव्या-सातव्या शतकापर्यंत गेली. या प्राचीन नगराविषयी अनेक नवीन बाबी उघडकीस आल्या. शिशुपालगडचा कालानुक्रमिक इतिहास स्तरशास्त्राप्रमाणे तीन कालखंडांमध्ये अनुक्रमे १) प्रारंभिक ऐतिहासिक काळ (इ. स. पू. आठवे ते  इ. स. पू. चौथे शतक), २) ऐतिहासिक काळ (इ. स. पू. तिसरे ते इ. स. चौथे शतक) आणि ३) उत्तर ऐतिहासिक काळ (इ. स. पाचवे शतक) मध्ये विभागला आहे.

शिशुपालगड येथील स्तंभ असलेल्या परिसराचे उत्खनन (२००८).

प्रारंभिक ऐतिहासिक काळामध्ये लोक उच्च प्रतीची, उत्कृष्ट भाजणीची काळ्या आणि तांबड्या रंगाची मूठ असलेली मृद्भांडी वापरत होते. तटबंदीच्या बाहेरील उत्खननात मातीचा भराव घातलेले तीन वर्तुळाकार आकाराचे दगडी अवशेष प्राप्त झाले. तटबंदीच्या बाहेर घराचे अवशेष प्राप्त झाले आहेत जे तटबंदीच्या आतल्या भागापेक्षा आकाराने मोठे आणि मोकळे आहेत, ज्यामध्ये मृद्भांडी, धातू इत्यादी पुरावशेष प्राप्त झाले. नगराच्या तटबंदीचे निर्माणकार्य इ. स. पाचव्या शतकापूर्वी झाले होते, असे या उत्खननामुळे लक्षात आले.

शिशुपालगडच्या दुसऱ्या ऐतिहासिक कालक्रमात वसाहतीमध्ये बराच बदल दिसून येतो. या काळात, लोकांच्या घरांच्या रचनेमध्ये बदल दिसून येतो. घरबांधणीकरिता पहिल्यांदा भाजलेल्या विटांचा वापर दिसून येतो आणि छताकरिता भाजलेले कवेलू वापरात आल्याचे पुरावे प्राप्त झाले. या काळात, लोकांच्या आवडीनिवडी मध्येही परिवर्तन दिसून येते. यांमध्ये रूलेटेड, काळी चकाकीयुक्त आणि तांबडी चकाकी असलेल्या मृद्भांड्यांचा वापर, लोकांच्या वैयक्तिक अलंकारामध्ये वृद्धी आणि गतकाळापेक्षा नवीन वस्तू दृष्टिगोचर होतात. सांस्कृतिक स्तर क्रमातील हा बदल शिशुपालगड येथील तत्कालीन काळातील सामाजिक आणि आर्थिक विकास दर्शवतो. महत्त्वाचे म्हणजे याच काळात मौर्य सम्राट अशोक याने कलिंगवर आक्रमण केले होते, परंतु त्याच्या विजयाने शिशुपालगड येथील तत्कालीन परिस्थितीवर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. इ. स. पू. पहिल्या शतकातील चेदी नरेश खारवेल याच्या उदयगिरी येथील हाथीगुंफा अभिलेखात वादळाने कमकुवत झालेल्या ‘कलिंगनगरीʼ या राजधानीच्या तटबंदी आणि प्रवेशद्वाराची दुरुस्ती केल्याचे नमूद केले आहे. शिशुपालगडच्या उत्खननांमध्येही तटबंदीच्या पश्चिम आणि उत्तर प्रवेशद्वाराची डागडुजी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे तटबंदीच्या आत उभे असणारे अठरा स्तंभ आणि उत्खननात प्राप्त लगतचे चापाकार स्थापत्य याच कालखंडातील आहे. अशा प्रकारे ‘कलिंगनगरीʼ हे स्थळ आजचे शिशुपालगड असल्याचे भक्कम पुरावे प्राप्त झाले आहेत.

उत्तर ऐतिहासिक काळामध्ये लोकांनी तटबंदीच्या आत उत्तरेकडे वस्ती केल्याचे पुरावे प्राप्त  झाले. प्रथम या काळातील लोकांनी चाक आणि पुष्पाची छाप असलेली मृद्भांडी वापरली व नंतर राखडी रंगाची खोबणीयुक्त नवीन पद्धतीची मृद्भांडी वापरात आणल्याचे प्रमाण प्राप्त झाले. ओडिशाच्या इतर पुरास्थळांमध्ये या राखडी मृद्भांड्यांना मध्ययुगीन कालखंडात समाविष्ट केले जाते. या काळातील स्थापत्य बांधकामाचा कोणताही पुरावा मात्र उत्खननांत आढळला नाही.

उत्खनन आणि सर्वेक्षणांमुळे शिशुपालगड या सुनियोजितपूर्ण नगराच्या आत प्रवेशद्वारापासून काटकोनात छेद देणाऱ्या रस्त्यांची व्यवस्था, राजवाडा, राजतंत्रीय किंवा प्रशासनिक भवनाचे स्थापत्य, सामान्य लोकांची निवासस्थाने, नाणी आणि इतर महत्त्वपूर्ण पुरावे प्राप्त झाले. उत्खननात प्राप्त एकूण पुरावशेषांच्या आधारावर असे दिसून येते की, प्राचीन शिशुपालगड या नगराचा आवाका मोठा होता व नगरात विपुल लोकसंख्या व आर्थिक स्थैर्य होते. शिशुपालगड हे पूर्व भारतातील महत्त्वाचे राजकीय, आर्थिक, व्यापारी आणि क्षेत्रीय केंद्र म्हणून कार्यरत होते. या उत्खननामुळे शिशुपालगड पासून ९ किमी. अंतरावर असलेल्या अशोकाच्या धौली येथील अभिलेखात नमूद ‘तोसलीʼ हे स्थळ शिशुपालगड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इ. स. सहाव्या शतकानंतर येथील वस्तीचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले. येथील वस्ती साधारणतः १.५ किमी. पश्चिमेकडे मंदिर परिसरात स्थानांतरित झाल्याने हे पुरास्थळ ओस पडण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत हे पुरास्थळ भुवनेश्वर शहराचा भाग बनलेले असून अतिक्रमणामुळे सदर स्थळ नष्ट होण्याचा मार्गावर आहे.

संदर्भ :

  • Lal, B. B. ‘Sisupalgarh 1948: An Early Historical Fort in Eastern Indiaʼ, Ancient India, 5, P. 62-105, 1949.
  • Mohanty, R. K & Monika, L. Smith, ‘Excavations at Sisupalgarh 2005ʼ, Man and Environment, XXXI (1): 27-32, 2006.
  • Mohanty, R. K.; Smith, M. L.; Donkin, A. & Greene, G. A. ‘Archaeological Research at Sisupalgarh 2007: An Early Historical City in Orissaʼ, Puratattva, Vol 37:142-154, 2007.
  • Smith, Monika & Mohanty, R. K. ‘Excavations at Sisupalgarh 2005-2006ʼ, Bulletin of the Deccan College Postgraduate and Research Institute, 66-67: 191-198, 2007.

                                                                                                                                                                                       समीक्षक : प्रमोद जोगळेकर

साईबाबा मंदीर, भुवनेश्वर :-
    या मंदिराची उभारणी होउन याचे उदघाटन १५ फेब्रुवारी १९९५ ला झाले.इथे साईभक्तांची मोठी गर्दी असते. साईबाबांच्या भक्तांच्या मागणीवरुनच या मंदीराची उभारणी झाली.सध्या मंदीराच्या प्रशासन समितीतर्फे याची देखभाल केली जाते. इथे साईबाबांच्या संबधित वेगवेगळ्या उत्सवाचे आयोजन केले जाते.
इंफो सिटी :-
    प्रचंड मोठ्या परिसरात आणी देखण्या आवारात अत्याधुनिक शहर उभारले आहे, ते म्हणजे इंफो सिटी.इथे मोठ्या प्रमाणात व्यापारी उलाढाली होतात. बहुतेक सर्व नामवंत ब्रँडच्या वस्तु एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सहाजिकच इथे खरेदी करायला आल्यावर वेगवेगळ्या दुकानात जाण्याची गरज रहात नाही. या वास्तुची रचनाही आधुनिक आहे.इथे बहुतेक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वस्तु उपलब्ध आहेत. भुवनेश्वरच्या भेटीत इथे येउन खरेदीचा आनंद घेता येइल.
आधुनिक तंत्रज्ञानाने उभारलेली फॉर्च्युन टॉवर एक भव्य इमारत आहे. इथे आय.टी.पार्क उभारणीच्या दृष्टिने या इमारतीची उभारणी झाली. हि सात मजली इमारत ३.६१  एकरात वसलेली आहे. भुवनेश्वरमधील ओबेरॉय टॉवरजवळ हि इमारत आहे. या इमारतीत आय.टी,पार्क, कॅप्सुल आणी सर्विस लिफ्ट तसेच कार्पोरेट हबसहीत सर्व आधुनिक सोयी आहेत. हि पुर्ण इमारत वातानुकुलीत आहे तसेच इथे जिमखाना, कॅफेटेरीया, कॉन्फरन्स हॉल, बिझनेस सेंटर आणि पार्किंगची सोय आहे. तसेच इथून थेट आंतरराष्ट्रीय नेटवर्क उपलब्ध केले आहे, या इमारतीत रिलायन्स इंडस्ट्री, मित्तल स्टील, एस.टी.पी.आय., पॉस्को तसेच ओ.पि.जी.सी.चे ऑफिस आहे. 
 
भुवनेश्वर शहरातील आधुनिक पर्यटनस्थळे बघीतल्यावर आता जाउया जुन्या भुवनेश्वर शहारात.सिटी ऑफ टेम्पल म्हणून ओळखल्या जाणार्‍या भुवनेश्वर शहरात मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत.आता आपण याच मंदीराची माहिती घेणार आहोत.पण त्यापुर्वी हि मंदिरे ज्या शैलीत उभारली आहेत, त्या कलिंग मंदिर शैलीची माहिती घेउया.
कलिंग मंदिरस्थापत्यशैली :-
  ओडिशातील मंदिरं कलिंग स्थापत्यशैलीचा अनुपम आविष्कार

      ओडिशा राज्यात एकाहून एक सुंदर अशी पाचशेहून अधिक प्राचीन मंदिरं आहेत. ओडिशामधल्या मंदिरस्थापत्यशैलीबद्दल आणि ओडिशाच्या इतिहासाबद्दल थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे.
         भारतीय मंदिरस्थापत्यशैलीचे साधारणतः तीन प्रकार मानले जातात. दक्षिण भारतात प्रचलित असलेलं द्रविड स्थापत्य, उत्तर भारतात प्रचलित असलेलं नागर स्थापत्य आणि या दोहोंचं मिश्रण असलेली वेसर मंदिरशैली. नागर मंदिरशैलीचे काही उपप्रकार उत्तर भारताच्या निरनिराळ्या राज्यांमध्ये पाहायला मिळतात. त्यांपैकी कलिंग देशातील, म्हणजे आजच्या ओडिशा राज्यातील, मंदिरस्थापत्यशैली अत्यंत प्रेक्षणीय मानण्यात येते. या उपशैलीस ‘कलिंगशैली’ असं म्हणतात. जगन्नाथपुरी व कोणार्क इथली मंदिरं कलिंग स्थापत्यशैलीचा प्रगत आविष्कार आहेत. खुद्द ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये कलिंगशैलीची अनेक मंदिरं असून त्यांपैकी शंभर तरी उत्तम स्थितीत आहेत.
   पण ही कलिंग स्थापत्यशैली नेमकी आहे तरी कशी? तर वर सांगितल्याप्रमाणे कलिंग मंदिरस्थापत्य हा उत्तर भारतीय नागर मंदिरशैलीचाच एक उपप्रकार आहे. नागरमंदिरस्थापत्यशैलीची सर्व वैशिष्ट्यं, म्हणजे चौकोनी गर्भगृह, त्यापुढचं आयताकृती अंतराळ, त्याला जोडून भव्य चौकोनी किंवा आयताकृती सभामंडप आणि गर्भगृहावरील उंच, निमुळतं शिखर हे सगळं कलिंग मंदिरस्थापत्यशैलीतही आपल्याला बघायला मिळतं. कलिंगमंदिरांचं शिखर एकाच रेषेत वर झेपावत निमुळतं होत जाणारं, बघणाऱ्या भाविकांचं लक्ष जमिनीपासून ते थेट शिखरावरच्या कलशापर्यंत नेणारं व वर गोल आमलक असलेलं असतं. मंदिराच्या निमुळता होत गेलेला भाग थरांनी बनलेला असतो. प्रत्येक थर त्याच्या खालच्या थरापेक्षा लहान होत जातो. त्याची कडा जरी दंतुर असली तरी ती रेषेप्रमाणे म्हणजे रेखेप्रमाणे सलग दिसते म्हणून रेखा देऊळ. 
रामेश्वर मंदीर

मंदिराचा ढोबळ आराखडा
उडिशा देवळाची संपूर्ण रचना ( कल्याण,नाट्य,भोगमंडप आणि देऊळ असे चार भाग असतात) पाहायला मिळते.मंदीर रचना

याचे एक उदाहरण म्हणजे जालावरून उतरवलेली हि एक आकृती ज्यामध्ये जास्त तपशिल बघायला मिळतील.
   ही मंदिरं सहसा ओडिशा राज्यात सहज आढळणाऱ्या लाल-गुलाबी वालुकाश्म दगडात घडवलेली असतात. मंदिराबाहेर असलेल्या देवकोष्ठांमधल्या मूर्ती उंचीला छोट्या असल्या तरी त्यांचं शरीरसौष्ठव व सुबकपणा डोळ्यात भरण्यासारखं असतं.
     कलिंग स्थापत्यशैलीच्या हिंदुमंदिरांच्या बांधणीला ओडिशामध्ये साधारण सातव्या शतकात सुरुवात झाली. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात ओडिशामध्ये महाभावगुप्त जनमेजय या राजानं नवं राज्य स्थापन करून कटकपर्यंत सीमाविस्तार केला. त्याच्या नातवानं म्हणजे महाशिवगुप्त ययाती नावाच्या राजानं स्वतःचं केसरी नावाचं राजघराणं सुरू केलं. भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराजमंदिर हे याच सुमारास बांधलं गेलं. पुढं अकराव्या शतकात या केसरी राजवंशाचा पराभव करून गंग वंशाचा राजा तिसरा वज्रहस्त यानं त्रिकलिंगाधिपती ही पदवी धारण केली. त्याचा नातू अनंतवर्मन् चोडगंग यानं अकराव्या शतकाअखेर पुरीचं जगन्नाथमंदिर बांधून पूर्ण केलं असं मानलं जातं. याच गंगवंशाचा राजा ''राजा नरसिंहदेव पहिला'' यानं कोणार्कचं प्रसिद्ध सूर्यमंदिर बांधून घ्यायला प्रारंभ केला.
     केसरी आणि गंग या दोन्ही राजवंशातील राजांनी साहित्य, संगीत व स्थापत्य या कलांना उदारहस्ते आश्रय दिला. आज आपल्याला दिसणारं कलिंग मंदिरस्थापत्य हे प्रामुख्यानं या दोन राजवटींची देणगी.खजूराहो आणि भूवनेशवर ,कोणार्कच्या शिल्पांची तुलना केली .इकडच्या मूर्ती अधिक भावपूर्ण जाणवतात तर खजूराहोच्या मूर्तींचे चेहरे यांत्रिक आणि कोरिव एकसारखे वाटतात .
       ओडिशामधल्या मंदिरांची विभागणी साधारणतः तीन खंडांत करता येईल, साधारणतः सातवं ते नववं शतक, यामधील कलिंगस्थापत्याच्या बाल्यावस्थेचा काळ. नवव्या ते बाराव्या शतकादरम्यान ऊर्जितावस्थेचा काळ आणि शेवटचा एका शतकाचा उत्तरकाल.साधारणतः तेराव्या शतकानंतर ओडिशावर इस्लामी राजवटींची वक्रदृष्टी वळली आणि भव्य नवी मंदिरं बांधणं तर जवळजवळ बंद झालंच; पण असलेल्या मंदिरांवरही अनेक हल्ले होऊन बरीच तोडफोड झाली. पुढं सोळाव्या शतकात बंगालचा सुलतान सुलेमानखान याचा सेनापती काला पहाड यानं केलेल्या स्वारीत ओडिशाचा शेवटचा राजा मुकुंददेव पडला आणि राज्य बंगालच्या मुसलमानांच्या हातात गेलं. याच स्वारीत जगन्नाथपुरीचं मंदिर भग्न केलं गेलं व मंदिरामधल्या मूर्ती चिल्का सरोवरातल्या एका बेटावर हलवण्यात आल्या हा इतिहास बऱ्याच जणांना माहीत असेल.
     सुरुवातीला कलिंगमंदिरांचं स्थापत्य हे नागर शैलीच्या इतर मंदिरांसारखंच होतं; पण पुढं गरजेनुसार त्यात बदल होत गेले. कलिंगमंदिरांचे स्थापत्यशैलीच्या दृष्टीनं तीन उपप्रकार निर्माण झाले, ते म्हणजे ''रेखा देऊळ'', ''पीढा देऊळ'' व ''खाखरा देऊळ''. रेखा देऊळ म्हणजे चौकोनी गाभाऱ्यावर निमुळतं होत जाणाऱ्या शिखराचं देऊळ. या प्रकारात बघणाऱ्या भाविकांची नजर शिखरावरून सरकत सरळ आमलकापर्यंत जाते. पीढा देवळाचं शिखर पसरट, पिरॅमिडसारखे अनेक टप्प्यांचं मिळून होतं, तर खाखरा देऊळ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असलेली आयताकार वास्तू.आपण मंदिराच्या ज्या भागाला मंडप असं म्हणतो त्यालाच तिकडे ‘जगमोहन’ असं म्हणतात, गाभाऱ्याच्या वर असलेल्या शिखराला रेखा देऊळ तर मंडपाच्या  (जगमोहनाच्या) वर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात.
       कलिंग मंदिरस्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे, ‘जगमोहन’ या नावानं ओळखला जाणारा गर्भगृहापुढचा प्रशस्त चौरस सभामंडप. त्यावर सामान्यतः पीढा पद्धतीचं पसरट छप्पर असतं. त्यापुढील गर्भगृहावरचं छप्पर मात्र रेखा पद्धतीचं असतं. पुढं मंदिरातील धार्मिक उपचार व आन्हिकं वाढत गेली, तसं जगमोहन या मुख्य मंडपाला आणखी मंडप जोडण्यात येऊ लागले. हे सगळे बहुधा जगमोहनला जोडून व त्याच ओळीत असत. अशा मंडपांना भोगमंडप व नृत्यमंडप अशी नावं मिळाली. कलिंग स्थापत्यशास्त्र जसजसं प्रगत होत गेले तसतशी शिखरांची उंची वाढू लागली. जगमोहनाचा विस्तार वाढला आणि वरच्या पीठांच्या थरांच्या संख्येतही वाढ झाली. कोणार्कच्या मंदिरात हे सर्व बघायला मिळते. 


जालावरून विषयातील तज्ञांचे जालावरून उचललेले आहे. मी त्या क्षेत्रातला तज्ञ नसल्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. आपण कौतुकाने वाचताहात हेच माझ्यासाठी खूप आहे. आतून बाहेरून जवळजवळ इंचन इंच व्यापणारी आहे असे वाटणारी एवढी भरगच्च कलाकुसर आपल्याकडच्या काळ्या दगडात केलेली आहे? मी तुम्हाला आव्हान देत नाही तर आश्चर्याने विचारत आहे. तसे असेल तर वस्तुस्थिती त्या विधानाला छेद देणारी आहे असे म्हणावे लागेल. अजिंठ्यात तरी मला एवढी भरगच्च कोरीव कलाकुसर आढळली नाही.

एवढी बारीक कलाकुसर वालुकाश्म, संगमरवर अशा मृदु दगडातच होऊ शकते असे वाचल्याचे मला आठवते आहे.

वेरूळ मंदिर वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. एकाच दगडातून कोरलेले आणि आधी कळस मग पाया या रीतीने बनल्यामुळे.आणि दुसरे म्हणजे काळ्या दगडातली कलाकुसर एवढी बारीक आणि भरगच्च आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळते? भुवनेश्वरमध्येच पाचशेपेक्षा जास्त मंदिरे आहेत. ओदिशात इतर ठिकाणी देखील बरीच मंदिरे आहेत. कृपया हे आव्हान समजू नये. मी वस्तुस्थिती जाणून घेतोय आणि ते विधान पडताळून पाहातोय.

पुढील दोन प्रकाशचित्रे पाहा. नृसिंहमंदिरातली आहेत. अर्धवट सोडलेली वाटतात. अगोदरची आहेत, समकालीन आहेत की नंतरची आहेत हे ठाऊक नाही. पण फरक स्पष्ट आहे.

नृसिंहमंदिरातले काळ्या दगडातलेशिल्प

नृसिंहमंदिरातले काळ्या दगडतले शिल्प

कंकणावर कलाकुसर नाही. नागाच्या शरीरावर खवले काढलेले नाहीत. अर्थात शिल्प अपुरे आहेच. पण हे तपशील अपुरे आहेत की कोरता येत नाहीत?

मंदिरे पाहण्याचा क्रम -
मुख्य मंदिरे
१) अनंत वसुदेव - उडिया मंदिराची छोटी प्रतिकृती. फारनर आत जाऊ शकतात. फोटो काढता येतात. हे अगदी बिंदुसागर तलावासमोरच आहे.
२)लिंगराज - मोठे पुजा होणारे देऊळ. फोटोग्राफी बंदी.
३) कोटितिर्थेश्वर छोटा तलाव/कुंड.
४) स्वर्णजलेश्वर - शिल्पे आहेत शिखरावर.
५)परशुरामेश्वर - छान शिल्पे.,६)सिद्धेश्वर आणि ७) मुक्तेश्वर - सुंदर एकाच आवारात आहेत.
८) राजारानी. हे थोडे दूर आहे. मुक्तेश्वरपासून पंधरा मि चालत.
९)भास्करेश्वर आणि १०) ब्रह्मेश्वर ही दोन राजारानीपासून थोडी पुढे आहेत.
११) यामेश्वर आणि वेताळ देऊळ ही बिंदुसागर तलावापलिकडे.
बरेच पर्यटक फक्त लिंगराज मंदिर पाहातात.

शिव-विष्णूचं एकात्म प्रतीक : लिंगराजमंदिर
आज आपण भेट देणार आहोत ते मंदिर आहे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध मंदिर...श्रीलिंगराजमंदिर. इथं भगवान शिवांची उपासना श्रीत्रिभुवनेश्वर या नावानं केली जाते; किंबहुना भुवनेश्वर शहराचं नावच या प्राचीन मंदिरावरून पडलं आहे.








    जुन्या भुवनेश्वरच्या केंद्रस्थानी असलेलं हे मंदिर इतकं भव्य आहे, की अगदी दुरूनसुद्धा आपल्याला या मंदिराचं शिखर दिसू शकतं. आज अस्तित्वात असलेली मंदिराची वास्तू साधारणतः अकराव्या शतकाच्या शेवटी बांधली गेलेली आहे असं पुरातत्त्वीय पुरावे सांगतात; पण लिंगराजमंदिराचे काही भाग मात्र चौदाशे वर्षांपेक्षाही जुने आहेत. इसवीसनाच्या सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ओडिया साहित्यातही या मंदिराचा उल्लेख येऊन गेलेला आहे. मदल-पंजी या नावानं प्रसिद्ध असलेल्या पुरीच्या जगन्नाथमंदिराच्या बाराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या इतिहासानुसार, भुवनेश्वरचं हे लिंगराजमंदिर प्रथम सहाव्या-सातव्या शतकात सोमवंशी राजा ललितेंदुकेसरी यानं बांधलं होतं. पुढं अकराव्या शतकात गंग राजवंशानं या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार केला. आज अस्तित्वात आहे तो बराचसा मंदिरसमूह अकराव्या शतकात बांधलेला आहे.
    प्रख्यात ओडिया इतिहासकार के. सी. पाणिग्रही यांच्या मते, आज अस्तित्वात असलेलं मंदिर सोमवंशी राजा उद्योत्‌केसरी यानं अकराव्या शतकात बांधून घेऊन पूर्ण केलं. या जागेचं वर्णन ब्रह्मपुराणात ‘एकाम्रक्षेत्र’ असं करण्यात आलं आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, हे मंदिर शशांकानं म्हणजेच चंद्रानं बांधलं.
चंद्र म्हणजेच सोम, अर्थात्‌ सर्व सोमवंशी राजे चंद्राला आपला मूळ पुरुष मानत असत, हेच कदाचित या आख्यायिकेमागचं ऐतिहासिक सत्य असावं.
   लिंगराजमंदिराचं प्रांगण जवळजवळ दीडशे चौरस मीटर आहे आणि कलशाची उंची पंचावन्न मीटर आहे. शेजारीच बिंदुसागर तलाव आहे. भाविकांची अशी धारणा आहे की, कृत्ती आणि वास या दोन राक्षसांशी युद्ध करून दमलेल्या आणि तहानलेल्या देवी पार्वतीसाठी साक्षात्‌ भगवान शिवांनी हा तलाव निर्माण केला आणि भारतातील प्रत्येक झऱ्याचं, तलावाचं आणि नदीचं बिंदुस्वरूप पाणी या सरोवरात साठवलं. हा परिसर भगवान शिवांना इतका आवडला की, त्यांनी लिंगस्वरूपात इथंच राहायचं ठरवलं. मंदिराच्या गर्भगृहात एक मोठं शिवलिंग आहे. ते स्वयंभू असल्याचं मानलं जातं. जवळजवळ आठ फूट व्यासाच्या या शिवलिंगात शिव आणि विष्णू हे दोघंही वास करतात अशी भाविकांची धारणा आहे. म्हणूनच या मंदिराला ‘हरिहरक्षेत्र’ असंही नाव आहे.

 

     मुख्य मंदिर चार भागांत आहे. गर्भगृह म्हणजे रेखादेऊळ, जगमोहन म्हणजे पिढादेऊळ. हे दोन्ही भाग मूळचे आणि त्यांना पुढं जोडलेले भोगमंडप आणि नटमंडप. गर्भगृह पंचरथ पद्धतीचं आहे, म्हणजे प्रत्येक बाजूच्या भिंतीचे किंवा बडाचे उभे पाच भाग केलेले आहेत. मधला रह-पग, त्याच्या दोन्ही बाजूंना एकेक अनुरथ-पग आणि दोन्ही कोपऱ्यांत एकेक कनिका-पग असे पाच रथ किंवा उभे भाग, तसंच गाभाऱ्याच्या भिंतीचे जंघा नावाचे दोन आडवे भाग केलेले आहेत आणि त्यांना जोडणारी मध्यमा आहे.
     खालच्या जंघाभागात चैत्यतोरणाकृती छपरांची देवकोष्ठे आहेत, तर वरच्या भागात सपाट छपरांची देवकोष्ठे आहेत. दोन्हींमध्ये वेगवेगळ्या मूर्ती बसवलेल्या आहेत. शिल्पपट्टात देव-देवता आणि सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. कलिंगस्थापत्यशास्त्रात सुरसुंदरींना आलसकन्या असं नाव आहे. या मंदिरातील आलसकन्या आकारानं लहान असल्या तरी अत्यंत कमनीय आहेत. तीन दिशांवरील भिंतींच्या मधल्या पट्‌ट्यातल्या मुख्य कोनाड्यात गणेश, कार्तिकेय आणि पार्वती यांच्या मूर्ती आहेत. गंडी म्हणजे शिखर, लहान आकारांच्या शिखरांच्या प्रतिकृतींचं मिळून ते झालं आहे. मुख्य शिखराची उंची ५५ मीटर आहे, तर पुढच्या जगमोहनाच्या शिखराची उंची २५ मीटर आहे. मंदिराच्या शिखराच्या बांधणीत विविध थर अशा उठावानं कोरून काढले आहेत, की त्यामुळे मंदिरावरचा छाया-प्रकाशाचा खेळ उठावदार होतो. शिखराच्या खालीच असलेल्या बरंडा या भागातही देवकोष्ठे आहेत आणि त्यात शिवांच्याच अवस्थिती म्हणजे दक्षिणेला अंधकान्तक, पूर्वेला लकुलीश आणि पश्चिमेला नटराज यांच्या मूर्ती आहेत. उत्तरेकडच्या कोनाड्यात चामुंडा आहे. शुकनासीवरती मोठा गजसिंह आहे. कलशावरच्या आयुधात श्रीविष्णूचं सुदर्शन आणि शिवांचा त्रिशूल, दोन्ही आहेत.
लिंगराज मंदिराचा कळस

लिंगराज मंदीर तिठ्यावर आहे. भ्रमणध्वनी, कॅमेरे वगैरे आत नेण्यास मनाई आहे. 
लिंगराज मंदिराचे प्रवेशद्वार

लिंगराज मंदिराचे प्रवेशद्वार
     मंदिरावरच्या सर्व शिल्पाकृतींच्या बाह्य रेषा लालित्यपूर्ण आणि सुबक आहेत. कलिंगशैलीच्या मंदिरांचं लिंगराजमंदिर हे एक भूषण आहे. वास्तुकला व मूर्तिकला या दोन्ही दृष्टींनी भुवनेश्वर इथलं लिंगराजमंदिर पर्यटकांचं-भाविकांचं मन मोहवून घेतं. मुख्य मंदिराच्या आवारात सूर्याचं, गोपालिनीदेवी या नावानं प्रसिद्ध असलेल्या पार्वतीचं, श्रीगणेशाचं, अनंताचं अशी इतरही अनेक लहान-मोठी मंदिरं आहेत. सर्व मंदिरपरिसर बघण्यात दोन तास सहज निघून जातात. पर्यटक आणि स्थानिक भाविक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी गजबजलेलं हे मंदिर चुकवू नये असंच आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी मंदिराचा काळपट सोनेरी वालुकाष्म दगड उन्हात प्रदीप्त होऊन झळाळत असताना हे मंदिर बघणं हा एक अत्यंत सुरेख अनुभव आहे.

बिंदुसागर तलाव :-

    लिंगराज मंदिराच्या उत्तरेला हा तलाव आहे.भुवनेश्वरमधील हे एक महत्वाचे स्थळ आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या ठिकाणाला पिकनिक स्पॉट म्हणून ही ओळख आहे. बिंदुसागर तलावाचा आकार १३०० फुट लांबी आणि ७०० फुट रुंद असा आहे.हिंदु भाविकांच्या दृष्टीने या सरोवराला खुप महत्व आहे. दरवर्षी लिंगराज मंदीरातील मुर्ती इथे आणल्या जातात आणि या तलावात त्यांना स्नान घातले जाते. सहाजिकच भाविकांच्या मते लिंगराजाच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या या मंदीरात जो कोणी स्नान करेल त्याची सर्व पापे धुवून निघतात. सहाजिक हे सरोवर खुप प्रसिध्द आहे.

बिंदुसागर सरोवर

बिंदुसागर सरोवर

लिंगराज मंदिराच्या तिठ्यावरून उजवीकडे जरा पुढे गेले की डाव्या हाताला बिंदुसागर सरोवर आहे.

बिंदुसागर सरोवरातील मंदीर

बिंदुसागर सरोवरातील मंदीर

 

अनंत वासुदेव मंदीर:-
अनंत वासुदेव मंदीर

अनंत वसुदेव मंदिराचा कळस/शिखर.


सरोवराचा किनारा म्हणजे एक उकिरडाच आहे. बिंदुसागर सरोवराशेजारच्या उकिरड्यासमोरच आहे अनंत वासुदेव मंदीर. बिंदुसागर तलावाभोवती पसरलेली सर्व शंकराचीच मंदिरे आहेत, त्यासमोरच असलेले अनंत वसुदेव मंदिर हे एकमेव विष्णू मंदिर आहे. मूर्ती पुरीच्या जगन्नाथासारख्या आहेत. गर्भगृहसोडून फोटो काढू देतात. गर्दी अजिबात नसते. अवश्य पाहा. लिंगराज मंदीर हे भुबनेश्वरातले महत्त्वाचे आहे पण मंदिरात फारनरना प्रवेश नाही. आवारात इतर छोटी मंदिरे आहेत.अनंत वसुदेव मंदिराच्या भोगमंडपात असे हारे नेतात त्यात भात,डालमा,भाज्यांची मडकी असतात. भोग ठेवतात तेव्हा अर्धा तास मंदिर बंद असते.

तंत्रोपासनेचं गूढ वैतालमंदिर

आपण पाहिलं की कलिंग मंदिरस्थापत्य हे उत्तर भारतात प्रचलित असलेल्या नागर मंदिरस्थापत्यशैलीचीच एक उपशैली आहे. कलिंग मंदिरशिखरांचे स्थापत्यशैलीच्या दृष्टीनं तीन उपप्रकार मानले जातात, ते म्हणजे रेखा देऊळ, पिढा देऊळ व खाखरा देऊळ. रेखा देऊळ म्हणजे चौकोनी गाभाऱ्यावर निमुळतं होत जाणाऱ्या उंच शिखराचं देऊळ. या प्रकारात, बघणाऱ्या भाविकांची नजर शिखरावरून सरकत सरळ आमलकापर्यंत जाते. पिढा देऊळ म्हणजे शिखर पसरट, पिरॅमिडसारखं अनेक टप्प्यांचं मिळून होतं, तर खाखरा देऊळ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असलेली आयताकार वास्तू.
    आज आपण ओळख करून घेणार आहोत ती वैताल देवळाची. नाव जरी ‘वेताळ देऊळ’ असं असलं तरी हे मंदिर समर्पित आहे चामुंडेश्वरीला. शहराच्या जुन्या भागात, लिंगराजमंदिराच्या जवळच हे मंदिर आहे; पण भुवनेश्वरला येणारे फार कमी पर्यटक या मंदिराला भेट देतात. खरं तर हे मंदिर बांधलं गेलं आठव्या शतकात. म्हणजे, आज जवळजवळ बाराशे वर्षं उलटली तरी हे मंदिर बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.भुवनेश्वर. मंदीरस्थापत्य शैलीच्या दृष्टीने हे मंदीर वेगळे आहे. मंदीराचा पाया चौरसाऐवजी आयताकृती आहे. त्यामुळे रुंदीपेक्षा लांबी जास्त आहे. घुमटावर एकाऐवजी तीन शिखरे आहेत. उजव्या हाताला जे पडके शिखर दिसते ते एका भग्न मंदिराचे आहे. कालापहाड नावाच्या एका धर्मवेड्या सुलतानाने ती फोडली. कोणार्कचे मंदीरही त्यानेच पाडले अशी आख्यायिका आहे.
    या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, त्याचं खाखरा पद्धतीचं शिखर. दक्षिणेकडील मंदिरांबाहेर उत्तुंग गोपुरं असतात, त्यांची शिखरं गजपृष्ठाकार असतात व वर कलशांची रांग असते. साधारण त्याच पद्धतीचं हे शिखर आहे. शिखरावर रांगेनं तीन कलश आहेत म्हणून या मंदिराला ‘तीन मुंडिया देउळा’ असंही म्हणतात; किंबहुना स्थानिक रिक्षाचालकांमध्ये हे मंदिर याच नावानं ओळखलं जातं. हे तीन कलश म्हणजे देवीच्या तीन रूपांचं प्रतीक मानलं जातं...महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.
वैतल मंदीर

वैतल मंदीर
वैतल मंदीर
   
 साधारणपणे भगवान शिव, श्रीविष्णू आणि सूर्यदेव आदी पुरुषदेवतांची देवालयं बांधताना रेखा व पिढा शैलीच्या शिखरांचा उपयोग केला जातो आणि देवीची मंदिरं, त्यातही तंत्रोपासना जिथं व्हायची अशी मंदिरं, खाखरा देऊळशैलीत बांधली जात असत. मंदिराबाहेर छोटेखानी मंडप म्हणजे जगमोहन आहे; पण त्यावर नेहमीचं पिढापद्धतीचं शिखर नाही. छप्पर सपाट आहे. मुख्य मंदिराच्या बाजूलाच रेखापद्धतीच्या शिखराचं शंकराचं मंदिर आहे. शीर्षेश्वर या नावानं ओळखलं जाणारं हे मंदिर चामुंडामंदिराच्या मानानं अगदीच दुर्लक्षित आहे. मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भैरव, श्रीगणेश, लकुलिश आणि सप्तमातृका यांची सुरेख शिल्पं आहेत. इथल्या आलसकन्याही अतिशय सुरेख आहेत. मूर्ती आकारानं लहान असल्या तरी अत्यंत सौष्ठवपूर्ण आणि नाजूकपणे कोरलेल्या आहेत.
    या मंदिराच्या बाह्य भिंतीचं वैशिष्ट्य म्हणजे, गाभाऱ्याच्या भिंतीच्या देवकोष्ठांमध्ये असलेल्या दोन भव्य प्रतिमा! एक आहे अर्धनारीश्वराची. अर्धा शिव आणि अर्धी शक्ती अशा स्वरूपात असलेली ही मूर्ती म्हणजे कलिंग शिल्पकारांनी साकारलेली एक श्रेष्ठ कलाकृती आहे. शिवांच्या बाजूची शरीराची ठेवण आणि पार्वतीच्या बाजूची कमनीयता, पार्वतीच्या अंगावरचे दागिने, तिच्या चेहऱ्यावरचे कोमल भाव आणि शिवांच्या देहबोलीतला, चेहऱ्यावरचा पुरुषी कणखरपणा दाखवण्यात तो अनाम शिल्पकार कमालीचा यशस्वी झालेला आहे. दुर्दैवानं शिवांच्या बाजूचा एक हात नंतर झालेल्या इस्लामी आक्रमणात तुटलेला आहे.
   इथली महिषासुरमर्दिनीची मूर्ती तर अत्यंत सुरेख आणि लयबद्ध आहे. अष्टभुजा देवी एक पाय महिषासुराच्या खांद्यावर रोवून उभी आहे. तिचा त्रिशूल त्याच्या गळ्यात रुतलाय. दुसऱ्या हातानं तिनं महिषाचं डोकं एका बाजूला वळवलेलं आहे. देवीच्या त्वेषापुढं, शक्तीपुढं महिषासुर असहाय्य आहे. त्याची असमर्थता त्याच्या देहबोलीतून दिसते आहे. देवीचा चेहरा, तिचा केशकलाप, तिच्या हातातली विविध शस्त्रं आणि ती उगारण्याचा तिचा आवेश, तिच्या अंगावरचे अगदी मोजकेच दागिने या सर्व गोष्टींमुळे हे शिल्प अत्यंत सजीव वाटतं. कितीही वेळा या शिल्पाकडे पाहिलं तरी मनाचं समाधान होत नाही.
   या मंदिराच्या प्राकारात आणखी चार लहान मंदिरं आहेत. या मंदिराचं नाव वेताळ असलं तरी गर्भगृहात चांमुडादेवी आहे. गर्भगृहात नेहमी गूढ अंधार असतो आणि त्यात देवी चामुंडेश्वरीची डोळे खोल गेलेली, फासळ्या दाखवणारी, उग्र चेहऱ्याची मूर्ती! इथं प्राचीन काळी शाक्त पंथाचा प्रभाव होता आणि त्यांची तांत्रिक उपासना या मंदिरात चालायची असं पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे मंदिर ओडिशा राज्यात सहज सापडणाऱ्या लाल-गुलाबी वालुकाश्म दगडात घडवलेलं आहे. पहाटेचे पहिले सूर्यकिरण या दगडावर पडले की हे मंदिर सोन्यात घडवल्यासारखं झळाळून उठतं. सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी हे मंदिर बघणं हा एक अनोखा सौंदर्यानुभव आहे. एकेकाळी हे मंदिर रस्त्याच्या पातळीला होतं; पण इतक्या वर्षांत वारंवार डागडुजी करून रस्त्याची उंची वाढलेली आहे, त्यामुळे मंदिर खाली गेलेलं आहे.
   मंदिराबाहेर असलेल्या देवकोष्ठांमधल्या मूर्ती उंचीला छोट्या असल्या तरी त्यांचं शरीरसौष्ठव व सुबकपणा डोळ्यांत भरण्यासारखा असतो. भुवनेश्वरच्या इतर प्रसिद्ध मंदिरांपेक्षा वेगळं असं हे वैतालमंदिर आवर्जून पाहिलंच पाहिजे असं आहे. 

मुक्तेश्वर मंदीर :-

 आपल्याला आता भुवनेश्वरचे सगळ्यात सुरेख मुक्तेश्वर मंदिर बघायचे आहे.भुवनेश्वर. ओदिशातील वालुकाश्मापासून बनवलेला मंदीरस्थापत्यातला एक सुंदर हिरा म्हणजे मुक्तेश्वर मंदीर असे एम एम गांगुली म्हणतात. मंदीर पाहिल्यावर यात अजिबात अतिशयोक्ती नाही हे लक्षात येते. खरे तर देखण्या मंदीरवास्तूंचा हा एक समूहच.


 
मुक्तेश्वर मंदिर आणि परिसर

    उत्तर भारतातील नागर मंदिर-शैलीचा ओडिशा राज्यातील आविष्कार म्हणजे कलिंग स्थापत्यशैली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिर हे साधारण नवव्या शतकात बांधले गेले. म्हणजेच कलिंग स्थापत्यशैलीच्या प्राथमिक व प्रगत या अवस्थांच्या सीमारेषेवरचे हे मंदिर आहे. ह्या शैलीची चरमसीमा पुढे कोणार्क आणि पुरीच्या मंदिरात गाठली गेली. हे मंदिर आजही उत्तम रीतीने सांभाळून राखलेले आहे. १०.५१ मीटर उंच असलेल्या या मदिरावरील प्रत्येक इंच अप्रतिम कलाकारीने नटलेला आहे. 
   कलिंग स्थापत्यशैलीत मंदिर शिखरांचे तीन उपप्रकार निर्माण झाले, रेखा, पीढा व खाखरा. ‘रेखा देऊळ’ या प्रकारात शिखराची बाह्याकृती उंच आणि निमुळती होत सलग आमलकापर्यंत जाते. ‘पीढा’ या प्रकारात छप्पर पायरीसदृश्य अनेक टप्प्यांचे किंवा मजल्यांचे मिळून होते तर ‘खाखरा’ म्हणजे गजपृष्ठाकार छप्पर असणाऱ्या शाला या आयताकार वास्तूचे कलिंग स्थापत्यशास्त्रातले रूप आहे. मुक्तेश्वर मंदिराचे शिखर रेखा पद्धतीचे तर बाहेरचा मंडप म्हणजे जगमोहन पीढा पद्धतीचा आहे.

मुक्तेश्वर मंदीर

मुक्तेश्वर मंदिराचा देखणा परिसर

    भुवनेश्वरच्या जुन्या भागात लिंगराज मंदिराच्या जवळच असलेले हे मुक्तेश्वर मंदिर आकाराने खरेतर अगदीच छोटे आहे. लिंगराज किंवा जगन्नाथाच्या मंदिराची भव्यता येथे नाही. पण अप्रतिम कोरीव कामाने नटलेले हे मंदिर नाजूक कलाकुसर केलेल्या एखाद्या दागिन्यातल्या हिऱ्यासारखे भुवनेश्वरच्या मंदिरांच्या प्रभावळीत उठून दिसते. खरेतर हा एक मंदिर समूह आहे.
   एकेकाळी ह्या जागेला सिद्धारण्य असे नाव होते. एका बाजूला मुक्तेश्वर मंदिर आणि दुसऱ्या बाजूला छोटी छोटी अनेक मंदिरे आहेत. अतिशय शांत आणि रमणीय असा हा परिसर आहे. जवळपासचे अनेक रहिवासी संध्याकाळी ह्या मुक्तेश्वर मंदिराच्या परिसरात फिरायला आलेले दिसतात.
ओरिसा मंदिर स्थापत्य आणि मुर्तीशास्त्र या दोन्हीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आणि तेवढेच सुंदर असे हे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताना एका मोठ्या तोरणातून प्रवेश करावा लागतो जे अखंड कोरीव काम केलेल्या दोन खांबांवर स्थिरावलेले आहे. या मंदिराच्या भोवती कोरीवकाम केलेला सरंक्षण कठडा बांधला आहे.
   मुक्तेश्वर मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे याच्या जगमोहानात खांब नाहीत आणि आतून व बाहेरून या भिंती कोरीव कामाने सजवलेल्या आहेत.वरच्या दोन हातात पकडलेला नाग, एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात त्रिशूळ, चेहऱ्यावर शांत भाव आणि एका हाताने पार्वतीच्या गालाला केलेला स्पर्श असं हे नटराजाचं शिल्पं तिथल्या कलाकारांच्या प्रतिभेचा पुरावा म्हणून पुरेसं आहे.
   या मंदिरावर माकड आणि मगर यांच्या पंचतंत्रातल्या कथा सुद्धा कलाकारांनी कोरून ठेवल्या आहेत. जगामोहानाच्या आतल्या बाजूला छतावर कोरलेल नृत्य गणेश, शेजारी मोर असलेला कार्तिकेय नीट बघितल्याशिवाय दिसत नाहीत.
   मुक्तेश्वर मंदिराचे मंडपाचे म्हणजेच जगमोहनाचे छप्पर पिढा पद्धतीचे पायऱ्या पायऱ्यांनी बांधलेले आणि गर्भगृह म्हणजेच रेखा देऊळ पाच उभ्या भागात विभागलेले, म्हणजेच पंचरथ पद्धतीचे आहे. ह्या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मुक्तेश्वर मंदिरासमोरचे तोरणद्वार. असे तोरणद्वार भुवनेश्वर मध्ये दुसऱ्या कुठल्याही मंदिरात नाही.( परंतु वैतल मंदिरातही असे तोरण दिसते.स्वतंत्र भारतात हल्ली बांधलेल्या अनेक मंदिरात किंवा अन्यत्र असे तोरण बांधलेले दिसते. उदा. शेगाव येथील आनंदसागर. ) मंदिरासमोर कोरीव कामाने विनटलेले दोन भक्कम खांब व त्यांवर धनुष्याकृती तुळई असे हे तोरण आहे. तोरणावर यक्ष-यक्षी, देवदेवता, गंधर्व ह्यांच्या शिल्पांची रेलचेल आहे. तोरणाच्या दोन्ही कमानीवर दोन अत्यंत सुंदर आणि कमनीय अश्या यक्षी पहुडलेल्या आहेत आणि त्यांच्या बाजूला अगदी जिवंतच वाटणारी दोन माकडे कोरलेली आहेत. अशी कोरीव तोरणे या काळातील मंदिरांमध्ये देशाच्या इतरही भागात बांधली जात. गुजरात मधील मोढेराच्या शिवमंदिरात असेच एक तोरण आहे.यावरील आसनस्थ स्त्रीआकृत्या आणि माकडांच्या तसेच मोरांच्या आकृत्या आपली दृष्टी खिळवून ठेवतात.मुक्तेश्वर

मुक्तेश्वर

मुक्तेश्वर मंदिरातले कोरीव काम:
मुक्तेश्वरची प्रवेशकमान
    मंदिराच्या इतर भागांवर अप्सरा, नाग-नागी, गजव्याल यांच्या मूर्तीचेही दर्शन होते. द्वारशाखेवर नवग्रह आहेत. देवळाच्या जंघा व इतर भागांवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत त्यात उंदीर व मोर ही वाहने असणारे गणपती व कार्तिकेय, लकुलीश, नाग-नागी, सूर्य आणि श्रीविष्णू ही शिल्पे उल्लेखनीय आहेत. मुक्तेश्वर मंदिराचे दुसरे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जगमोहनाच्या छतावर कोरलेले अप्रतिम वितानशिल्प. हे वितानशिल्प म्हणजे अप्रतिम कोरीवकाम केलेले आठ पाकळ्यांचे दगडी कमळ आहे. ह्या कमळाच्या सर्वात बाहेरच्या भागात प्रत्येक पाकळीवर एक अशा सप्तमातृका कोरलेल्या आहेत, आणि आठवा वीरभद्र. प्रत्येक मातृका तिच्या बाळासमवेत आहे.
  जगमोहनाच्या कोरलेल्या जाळीदार खिडक्या म्हणजेच जालवातायने अत्यंत सुंदर आहेत. ह्याच कमळाच्या आतील भागात कार्तिकेय आणि श्री गणेश ह्यांच्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत. हे वितानशिल्प खरोखर केवळ अद्भुत आहे.
    एकूणच मुक्तेश्वर मंदिराचा प्रत्येक कोपरानकोपरा अप्रतिम अशा नाजूक, रेखीव कोरीव कलाकुसरीने नटलेला आहे. हे शिवमंदिर असूनही मंदिरात नंदी नाही. गर्भगृहात शिवलिंग आहे ज्याची रोज पूजा होते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला आहे. कलिंगाच्या स्थानिक इतिहासाप्रमाणे हे मंदिर सोमवंशी राजा ययाती केसरी ह्याने नवव्या शतकात बांधवून घेतले. कलिंग स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक वॉल्टर स्मिथ ह्यांच्या मते स्मिथ हा राजा म्हणजे सोमवंशी सम्राट ययाती महाशिवगुप्त असावा.
   ह्या मंदिराचे पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी अगदी भरभरून कौतुक केले आहे. जेम्स फर्गुसनने ह्या मंदिराला ‘ओडिशाच्या मंदिरांमधला एक सुंदर हिरा’ असे म्हटलेले आहे. मुक्तेश्वर मंदिर पाहिल्याशिवाय आपली कलिंग स्थापत्यशैलीची सफर पूर्णच होऊ शकत नाही.दहा शतकाहून जास्त काळ मुक्तेश्वराने पर्यटकांना सतत आकर्षित करून बराच काळ खिळवून ठेवण्याचे कार्य केले आहे.

या मंदिराची स्थापत्यशैली ओदिशात पुढे अनुसरली गेली आणि विकसित देखील झाली. कळस जास्त रेखीव, उठावदार बनले आणि उभ्या आधारस्तंभांवरील शिल्पांचा साजशृंगार वाढला. जगमोहनच्या छतावर देखील आणखी सजावट वाढली, त्यांना त्रिकोणी आकार मिळाला तसेच मुख्य मंदीर आणि जगमोहन यांचा जोड विकसित होऊन जास्त सौंदर्यपूर्ण झाला.मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने परिपूर्ण असं हे मुक्तेश्वर मंदिर, कलिंग मंदिर स्थापत्य शैलीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे.


भुवनेश्वरची चित्रकारिणी
      ओडिशा राज्याची राजधानी, भुवनेश्वर ही मंदिरांची नगरी आहे. त्रिभुवनेश्वर म्हणजे शिवांची नगरी असलेल्या ह्या पवित्र जागेला शैव पुराणांमधून ’एकाम्रक्षेत्र’ किंवा हरक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सूर्यक्षेत्र कोणार्क, हरीक्षेत्र जगन्नाथपुरी आणि शिवक्षेत्र भुवनेश्वर ही तिन्ही ठिकाणे मिळून ओडिशा राज्याचा सोनेरी त्रिकोण होतो.
मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर हा परिसर महामेघवहन राजवटीच्या आधिपत्याखाली आला. खारवेल हा या राजकुलातला सगळ्यात महान राजा. त्याने भारतदिग्विजय केला होता. भुवनेश्वरजवळील उदयगिरी आणि खंडगिरी लेण्यांमध्ये त्याने खोदलेला शिलालेख आहे जो हाथीगुंफा शिलालेख ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
पुढे सातव्या शतकात केसरी नावाच्या सोमवंशी राजघराण्याने कलिंगमध्ये आपले राज्य स्थापन केले. भुवनेश्वरमधले सर्वांत प्रसिद्ध असे लिंगराज मंदिर याच राजवंशाने बांधले. त्यांच्यानंतर गंग राजवंशाने चौदाव्या शतकापर्यंत कलिंग देशावर राज्य केले. त्यांची राजधानी कलिंगनगरा सध्याच्या भुवनेश्वर शहराच्या ठिकाणी होती. भुवनेश्वर मधली बहुतेक सर्व जुनी मंदिरे ह्या दोन राजवंशाच्या काळात म्हणजे सातव्या ते तेराव्या शतकाच्या दरम्यान बांधली गेली.
अगदी आजही भुवनेश्वर आणि आसपासच्या परिसरात शेकडो लहानमोठी पुरातन मंदिरे आपल्याला दिसतील. आज आपण बघणार आहोत हे मंदिर आहे चित्रकारिणी देवीचे, म्हणजे सरस्वतीचे. जुन्या भुवनेश्वरमध्ये प्रसिद्ध लिंगराज मंदिराच्या अगदी जवळच हे मंदिर आहे. पण लिंगराज मंदिरामध्ये कायम पर्यटकांची, भाविकांची गर्दी असते. चित्रकारिणी मंदिर मात्र त्या मानाने अगदीच शांत आहे.
 सरस्वती ही विद्येची देवता, कलेची अधिष्ठात्री. साहजिकच तिचे मंदिर विद्यार्थीप्रियच असणार. अगदी आजही ह्या मंदिराच्या आवारात आसपासच्या वस्तीतले विद्यार्थी येऊन अभ्यास करताना दिसतात.  मंदिर समूह पंचायतन पद्धतीचा आहे. मधोमध मुख्य रेखा मंदिर आणि त्याचा पिढा पद्धतीचा जगमोहन आणि चारी बाजूंना परिसर देवतांची चार रेखा मंदिरे, त्यांच्यापुढे जगमोहन नाही. मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे, आणि आकाराने फार भव्य नसले तरी अप्रतिम कलाकुसरीने नटलेले आहे.
   साधारण तेराव्या शतकाच्या मध्यात हे मंदिर बांधले गेले असे मानले जाते. गंग राजा नरसिंह देव प्रथम या महापराक्रमी राजाने बंगालच्या मुसलमान सुलतानाला हरवून यवनवाणीबल्लव आणि अमीरमानमर्दन अशा दोन उपाधी धारण केल्या. थेट शत्रूच्या प्रदेशात सैन्यासह मुसंडी मारून कटासीनच्या किल्ल्यात झालेल्या युद्धात राजा नरसिंह देवाने इस्लामी मामलुक सल्तनतीवर निर्णायक विजय मिळविला. कोणार्कचे भव्य सूर्यमंदिर हे त्याच्या शौर्याचे प्रतीक आहे तर भुवनेश्वरचे चित्रकारिणी मंदिर त्याच्या कलाप्रियतेचे, रसिकतेचे.
   कलिंग मंदिराचे साधारण दोन आडवे भाग करता येतात, जमिनीपासून जिथे शिखर सुरू होते, तिथपर्यंतचा भाग म्हणजे बडा किंवा भिंत आणि नंतर वरवर चढत जाणारं शिखर म्हणजे, गंडी. बडा म्हणजे भिंतीचेही खालून वर असे चार आडवे थर पाडता येतात, सगळ्यात खालचा थर म्हणजे पिष्टी किंवा पीठ, ज्यावर सर्व वास्तूचा डोलारा उभा असतो. त्यावर पभाग म्हणजे प्रभाग, हा वेगवेगळ्या थरांनी मिळून बनलेला असतो. त्यानंतर येतो तो भिंतीचा मोठा भाग ज्यात देवकोष्ठे बसवलेली असतात. त्याला नाव आहे जंघा. त्यावरचा शिखराला जोडणारा भाग म्हणजे बरंडा.
   तसेच बडाचे म्हणजे गर्भगृहाच्या भिंतीचे उभे स्तरही असतात. गर्भगृहाच्या प्रत्येक भिंतीला दोन दिशांना दोन कोन असतात त्याना लागून असलेले स्तर म्हणजे कणिका पग आणि मधला एक स्तर म्हणजे रह-पग असे तीनच स्तर प्रत्येक भिंतीला असले तर त्या मंदिराला त्रिरथ मंदिर असे नाव आहे. पुढे मंदिरांचे आकार वाढले, भिंती उंचीला आणि रूंदीलाही भरपूर वाढल्या त्यामुळे अजून उभे स्तर रह-पग आणि कणिका-पगाच्या मध्ये निर्माण झाले. त्यांना अनुरथ पग आणि प्रतिरथ पग अशी नावे मिळाली आणि त्रिरथ मंदिर मोठे होऊन पंचरथ, सप्तरथ आणि अगदी क्वचित नवरथही झाले.
  चित्रकारिणी मंदिराचे रेखा देऊळ सप्तरथ प्रकारचे आहे तर जगमोहन पंचरथ पद्धतीचे आहे. जगमोहनाच्या भिंतीवरची जंघा दोन भागात विभागलेली आहे, खालच्या भागात पाच स्तंभांवर मिथुन शिल्पे कोरलेली आहेत तर उत्तरेकडच्या भिंतीवर वरच्या भागात वेणूगोपाळाचे सुंदर शिल्प आहे. दक्षिणेकडच्या भिंतीवर खालची स्तंभनक्षी तीच आहे पण वरचे शिल्प शिव-पार्वतीविवाहाचे आहे.
    बरीच शिल्पे दुर्दैवाने पुढे सोळाव्या शतकात मुस्लीम सुलतान काळा पहाडाच्या स्वारीत उध्वस्त केलेली आहेत. मंदिराच्या आवारात बरेच भग्नावशेष असेच पडलेले आहेत. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आता शांत सरस्वती नाही तर रौद्र चामुंडा आहे. त्यामुळे एक गूढ वातावरण अनुभवायला मिळते. छोटेसेच असले तरी चित्रकारिणी देवीचे हे मंदिर मुद्दाम जाऊन बघावे असेच आहे.
राजाराणी मंदीर

भुवनेश्वर. हे मंदीर ११व्या शतकातील आहे. या एका मंदिरातच भरपूर वैविध्य आढळते. पिवळसर वालुकाश्मामधील हे मंदीर १७.९८ मीटर उंच आहे. मंदीरस्थापत्याचा झालेला विकास इथे नाट्यपूर्ण रीतीने दिसून येतो. अमालकाभोवती आकाशाकडे जात असलेली चार टोके असलेल्या या मंदिराचे नाते खजुराहोच्या कंदारीय महादेव मंदिराशी जुळलेले दिसते. रेखा देऊळवरच्या नाजुक कंबरेच्या मानवी आकाराच्या बसलेल्या स्थितीतील आकृत्यातून कलावंताचे स्त्रीत्वाच्या सौंदर्याबद्दल असलेले वास्तव कौतुक दिसून येते तर आपल्या कलासक्त नजरेला एक संपन्न मेजवानीच मिळते. चार्लस फॅब्री म्हणतो इथे अनेक आश्चर्ये दडलेली आहेत.

राजा राणी मंदीर

राजा राणी मंदीर

राजा राणी मंदीर

राजा राणी मंदिराचे देखणे आवार.








प्रवेशद्वाराच्या दोन दगडी खांबांना कोरीव नागांनी विळखा घातला आहे. तस्सेच आणखी दोन खांब याच सभामंडपाच्या समोरून पाहातांना डाव्या बाजूला दिसताहेत. रेखा देऊळच्या वरील जे चपट्या भोपळ्यासारखे आडवे चक्र आहे त्याला अमालक म्हणतात. त्याच्या भोवती जी वर आलेली टोके आहेत ते या मंदिराचे वैशिष्ट्य. चारपैकी दोन टोके पहिल्या प्रकाशचित्रात दिसताहेत, दोन पलीकडच्या बाजूला आहेत.राजाराणी मंदीर पाठीमागून

राजाराणी मंदीर पाठीमागून

मुक्तेश्वर

मुक्तेश्वर

मुक्तेश्वर

खालील चित्रात डाव्या बाजूला तिरप्या उताराच्या मध्यभागी बाहेर डोकावणारे टोक आहे ते भो चिन्ह असावे. जावा सुमात्रा इथून आलेले. अंगकोरला पण आहे म्हणतात. मंदिराच्या शिखराच्या चार बाजूंना चार असतात.

खालील चित्रात पण एक भो चिन्ह दिसते आहे.
मुक्तेश्वर

त्या 'भो' चिन्हाला बहुधा डेन्टिल्स म्हणतात. रोमनांकडून आलेला हा प्रकार.

हा बघा टोका -प्रवरासंगम इथल्या मंदिराचा हा फोटो

a

जसे सभामंडपाला तिथे जगमोहन म्हणतात. त्यावर एकावर एक सपाट मजले ठेवल्यासारखे छप्पर असेल तर ते पीढ जगमोहन तसे तिथे अर्धचंद्राकृतीला चंद्रशाला म्हणतात. मगरींनी केलेल्या कमानीला आपल्यासारखेच मकरतोरण म्हणतात.वरील उल्लेखित मंदिरांबरोबरच राजाराणी मंदिराच्याच रस्त्यावर आणखी पुढे पूर्वेकडे शिल्पकलेचा अधिक खजिना : भास्करेश्वर व मेघेश्वर मंदिरे. व थोडे दक्षिणेस ब्रह्मेश्वर मंदिर. एकेकाचे बांधकाम तासनतास कौतुक करत पाहाव असं आहे. ओडिशा च्या मंदिरांची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे नागशिल्पे व कामशिल्पपट.

केदारेश्वर मंदीर :-
केदारेश्वर शिव आणि गौरी यांचे हे मंदीर मुक्तेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. या मंदिराला हर्षविमोचन मंदीर असेही म्हणतात. केदार आणि गौरी यांच्या शोककारक प्रेमकथेवर आधारित असे हे मंदीर राजा ललतेंदू केसरी याने हे मंदीर त्यांच्या स्मरणार्थ बांधले अशी दंतकथा आहे.

केदार आणि गौरी या प्रेमी युगुलाच्या प्रेमाला गांवकर्‍यांचा विरोध होता. म्हणून ते युगुल गांव सोडून निघाले. जंगलातून जातांना वाटेत गौरीला भूक लागली म्हणून केदार खायला काहीतरी आणायला म्हणून गेला. पण त्याला वाघाने मारून टाकले अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे. लुईस रोडने पूर्वेकडून किंवा हारामंदीर छाकातून पश्चिमेक्डून इथे जाता येते. मदिराची स्थापत्याची वैशिष्ट्ये तसेच शिल्पशैली यावरून ते इसवी सनाच्या ११व्या शतकातील सोमवंशी राजांच्या शासनकाळातले आहे हे समजते. याचा आराखडा पंचरथी आहे. यात ‘रेखा देऊळ’ आणि ‘पीढ जगमोहन’ आहे. मंदीर दक्षिणमुखी आहे आणि गाभार्‍याची उंची १३.७ मीटर आहे.

परशुरामेश्वर मंदीर

इसवीसनाच्या सातव्या शतकात बांधलं गेलेलं ओरिसा मधलं पहिलं  मंदिर – परशुरामेश्वर ! परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर ही दोन मंदिरं जवळजवळच आहेत. उंच, दगडी, कलिंग पद्धतीचे बांधकाम. दोन्ही मंदिरांवर सुंदर कोरीव काम आहे. अतिशय शांत, स्वच्छ, रमणीय असा परिसर आहे. एकूणच तिथे सगळ्याच मंदिरांच्या परिसरात चांगली स्वच्छता आढळते.या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी त्याच्याभोती आयताकृती भिंत बांधली आहे आणि अशी रचना ओरिसा मधल्या अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळते.
या मंदिरातली शिल्पं खूप सुंदर आहेत. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर समोरच गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर सुंदर गणपती कोरला आहे. आकाराने जरी हे मंदिर थोडं लहान असलं तरीही यावर शिल्पं मोठ्या प्रमाणात कोरली गेली आहेत. जगमोहनात (मंडपात)  प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या वर शंकराची उपासना करणारे साधक कोरले आहेत आणि दुसऱ्या दाराच्या वरच्या भागात अभिषेकलक्ष्मी कोरली आहे.
  जैन, बौद्ध यांनी सुद्धा ‘अभिषेकलक्ष्मी’ या शिल्पाचा मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्थापत्यामध्ये वापर केलेला आढळून येतो. कमळावर बसलेल्या लक्ष्मीला दोन सुशोभित हत्ती दोन्ही बाजूनी अभिषेक करत आहेत असे हे शिल्प आहे.

गमोहनाच्या भिंतीवर एका बाजूला गणपती आणि एका बाजूला वीरभद्र यांच्यामध्ये कोरलेल्या अष्टमातृका सुद्धा बघण्यासारख्या आहेत.
अष्टमातृका : अष्टमातृका किंवा सप्तमातृका या देवांच्या सिद्धी किंवा त्यांची शक्ती होत. प्राचीन काळापासून मातृका पूजनाचे पुरावे आपल्याला मिळतात. ब्रम्हाणी/ब्राम्ही (ब्रह्म), माहेश्वरी (शिव), कौमारी (कार्तिकेय), वैष्णवी (विष्णू), वाराही (वराह अवतार), इंद्राणी (इंद्र), चामुंडा आणि आठवी लक्ष्मी म्हणून सांगितली आहे.
याचबरोबर महिषासुरमर्दिनी, उमा-महेश्वर, कार्तिकेय यांची शिल्पं सुद्धा अत्यंत सुंदर कोरलेली आहेत.
परशुरामेश्वर मंदिराच्याच जवळ त्यानंतर बांधलं गेलेलं मुक्तेश्वर मंदिर आहे.मंदीरस्थापत्य बाल्यावस्थेत. मुख्य मंदीर आणि जगमोहन कसेतरी जोडले आहेत. नंतरच्या मुक्तेश्वर मंदिरात हा जोड इतका कलात्मक आहे की जोड कळतही नाही.

परशुरामेश्वर मंदीर


lingaraaj.jpg

परशुरामेश्वर मंदिर
kartikeya.jpg

परशुरामेश्वर मंदिरावरचे कार्तिकेयाचे शिल्प

lingaraaj2.jpg

परशुरामेश्वर मंदिरावरचे कोरीव काम

mukteshwar.jpg

mukeshwar2.jpg

परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर मंदिरावरून आपल्याला कलिंग मंदीरस्थापत्याच्या विकासाचे टप्पे जाणवतात. इसवी सन ८०० साली बांधलेल्या वैतल मंदिरातून अगदी भिन्न शैली आढळते. कलिंग शैलीतील खाखरा पद्धत यातून दिसते. तांत्रिक पंथाच्या मंदिरातून ही पद्धत दिसते. मंदिराचा कळस पाहिल्यावरच चट्कन फरक ध्यानात येतो. कळस आयताकृती आहे. जगमोहनशी काटकोन करणारा. तत्कालीन घरांच्या शाकारून बनवलेल्या किंवा लाकडी छपरासारखा याच्या छपराचा आकार आहे. चैत्य कमानीचा नालाकार एक मोहक प्रतीक आहे. आता पंचाईत आली. मुक्तेश्वराच्या तोरणासारखेच तर हे दिसते आहे. फक्त शेंदूर किंवा शेंदरी रंग फासलेला. मग या प्रतीकात व त्या तोरणात काय फरक आहे बरे? हा प्रश्न ते पाहाण्याअगोदर पडला होता. तिथे जाऊनच पाहिले तरी कळले नाही. मंदीरात पूजापाठ वगैरे काही चालत नाही. बकाल परिसरातले मंदीर पूर्णपणे निर्जन होते. त्यामुळे कोणाला काही विचारायचा प्रश्नच आला नाही.

हे प्रतीक फक्त बांधकामात नव्हे तर सजावटीच्या शिल्पातही सर्वत्र आढळते. इथे छपराचा आतील भाग साधासरळ आहे तर इतर मंदिरात त्यावर शिल्पकलेची भरपूर कलाकुसर आढळते. मंदिराच्या आकारात फारसा फरक नाही परंतु इथल्या जगमोहनच्या चार कोपर्‍यालगत मंदिराच्या छोट्या प्रतिकृती व्यवस्थित ठेवलेल्या आढळतात. एका धावत्या दृष्टिक्षेपात विकसित झालेली शिल्पसजावटीची शैली आढळून येते. बारीक निरीक्षण केल्यावर मात्र शिल्पसजावटीतली काळी बाजू आणि मंदिराचे व्यक्तिमत्व ध्यानात येते. हिंदू आणि बौद्ध धर्मातील काही तांत्रिक तत्त्वे एकत्र करून इथे शक्तीची उपासना केली जात असे. या उपासनेत तपशीलवार मंत्रविधी, गुप्तविधी आणि पवित्र बळीची प्रथा विकसित केली होती. वैतल मंदिराच्या गर्भगृहाचा अंतर्भाग जवळजवळ पूर्ण अंधारलेला आहे. मोजक्या तज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीतच इथले विधि उरकले जात होते असे मानतात. आदिशक्ती दुर्गेचेच एक तांत्रिक रूप चामुंडा ही इथली प्रमुख देवता आहे. अतिशय अंधुक प्रकाशात गळ्यात रुंडमाळा (मानवी मुंडक्यांची माळ) घातलेली, प्रेतावर बसलेली, एका बाजूला घुबड आणि दुसर्‍या बाजूला कोल्हा असलेली चामुंडेची प्रतिमा रंगवलेली दिसते. तिची अतिशय कृश अशी शरीरयष्टी, खोल गेलेले डोळे आणि खपाटीला गेलेले पोट डोळ्याना खुपते. नेहमी चाकोरीबद्ध वागणारे आदरणीय असे पुरातत्वखाते त्यांच्या भुवनेश्वरच्या मार्गदर्शिकेत म्हणते की सहन होणार नाही एवढे भयंकर असे तिचे रूप आहे पण त्याला आपण काही करू शकत नाही. माझ्या मते युद्धात असे भयंकर दृश्य, बली देतांना बलीने केलेला आक्रोश वगैरे भयंकर दृश्ये लहानपणापासून सतत पाहिल्यामुळे लढवय्या जातींचे मन कठोर, निबर व्हावे आणि मग युद्धात होणार्‍या अमर्याद हिंसेमुळे मानसिक धक्का किंवा दहशत बसू नये असा हेतू या शक्तीपूजेत असावा. आज जे सोशल इंजिनीयरिंग किंवा समाजाचे मनोरेखन करतात तसाच हा प्रकार असावा.

आंतील भिंती १५ वळचणींनी सजलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक प्रतिमा विचित्र आहे. गर्भगृहाच्या दरवाजातच आतील बाजूस चतुर्मुखी लिंग आहे. त्यावरही चित्रविचित्र प्रतिमा आहेत. त्यापुढे एक वधस्तंभ आहे. विशेषज्ञांच्या शब्दात येथील वातावरण ‘मनःशांती घालवणारे’, भंग करणारे आहे. पुरातत्व खात्याच्या थेट शब्दात सांगायचे झाले तर ‘विचित्र’ आहे. पूर्वेकडील बाहेरच्या बाजूला (सुदैवाने जिथे उजेड असतो त्या मागच्या बाजूला) सूर्यदेवाची सुंदर मूर्ती आहे. संवेदनाक्षम आणि सुंदर चेहरा असलेली. त्याच्या दोन्ही बाजूला उषा आणि प्रत्युषा आहेत. पहाटेच्या जुळ्या भगिनी. अरूण त्याचा रथ चालवतो आहे. हे प्रतीक मनावर ठसते. कोणार्कच्या मंदिरात हेच प्रतीक विकसित केले आहे. ओदिशी कलेतील पहिली कामुक शिल्पे इथे आढळतात. मुख्य इमारतीवरील आत घुसलेल्या पटावर. असे सांगतात की या विशिष्ट मंदिरात चालणार्‍या खर्‍या तांत्रिक विधींचा हा तक्ता आहे. इथे सादर झाल्यानंतर त्यांना अधिकृत दर्जाची ताकद मिळाली. नंतरच्या शतकांत या शिल्पांना मंदिरावरील सजावटीचे शिल्पप्रकार म्हणून स्वीकारले गेले.



हरीशंकरमधील एका उपमंदिरातील खास ओदिशी शैलीतली त्रिमूर्ती अगोदर टाकायची राहून गेली होती.
हरीशंकर

हुमा शिवमंदिरातील एक शिल्प
हुमा शिवमंदिराच्या आवारात

ही त्रिमूर्ती आता आठवत नाही. बहुधा समलेश्वरी मंदिरातली.
समलेश्वरी मंदिरातील आवारात

शिल्पकला अप्रतिमच आहे.

चौसष्ठ योगिनी मंदीर :-

हिरापूर गावाजवळ भुवनेश्वरच्या पूर्वेला फक्त 20 किमी अंतरावर असलेल्या महामाया पुस्करिणी तलावाशेजारी भातशेतीच्या मधोमध असलेले, सुंदर आणि रहस्यमय चौसठी योगिनी मंदिर हे ओडिशा राज्यात येणार्या पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे मंदिर 1953 पर्यंत सापडले नव्हते, जेव्हा ओडिशा राज्य संग्रहालयाचे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासकार केदारनाथ महापात्रा यांना एका उध्वस्त झालेल्या मंदिराच्या वालुकाश्माच्या चिर्यांचा ढीग सापडला. हे सर्व चिरे एकत्र जोडले गेले तेव्हा एक गोलाकार छतविरहित (हायपेथ्रल) रचना निर्माण झाली ज्यामध्ये ६४ स्त्री देवतांच्या म्हणजे योगिनींच्या प्रतिमा होत्या. या मंदीराचे वैशीष्ट्य म्हणजे
भुवनेश्वरजवळ दिसणार्‍या इतर कोणत्याही कलिंग शैलीतील मंदिरापेक्षा हे वेगळे आहे आणि विशेष म्हणजे ते वरून गोलाकार योनीसारखे दिसते.
         ६४ योगिनी अष्ट मातृकांवर आधारित आहेत  किंवा देवी, मातृदेवतेच्या आठ प्रमुख रूपांवर आधारित आहेत. या ब्राह्मणी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमरी, वाराही, चामुंडा आणि नरसिंही आहेत. या प्रत्येक योगिनीमध्ये आठ परिचारक असतात आणि जेव्हा त्या सर्व एकत्र होतात तेव्हा त्या ६४ योगिनी होतात.
     हिरापूर येथील योगिनी मंदिराच्या उभारणीची आख्यायिका इथले पुजारी सांगतात. त्याप्रमाणे, देवी दुर्गाने राक्षसाचा पराभव करण्यासाठी ६४ योगिनींचे रूप धारण केले होते. विजयानंतर, योगिनीनी दुर्गा मातेकडे प्रार्थना करुन त्यांना वाहिलेल्या मंदिराच्या रूपात त्यांची स्मृती राखली जावी अशी विनंती केली.मंदिराचे कार्बन डेटिंग करुन या मंदीराचा अंदाजे काळ ठरवला गेला आहे. काही विद्वानांचा असा अंदाज आहे की भौमा राजघराण्यातील राणी हिरादेई हिने ८ व्या - ९ व्या शतकादरम्यान हे उभारले असावे कारण हिरापूर (मूळचे हिरडेपूर) हे गाव तिच्या नावावरून पडले होते. मंदिरात असलेल्या काही स्थापत्य घटकांच्या आधारे, काही विद्वानांनी हाच काळ ११ व्या शतकाच्या नंतरचा असावा असा अंदाज बांधलेला आहे.
    मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन रक्षक आहेत. दक्षिणेकडील शिल्पात  (डावीकडे) कानातले दागिने आणि पीठावर कमळ लता असलेली पुरुष आकृती दर्शवते. उत्तरेकडील शिल्प (उजवीकडे) अगदी वेगळे आहे, विखुरलेले केस, बाहेर आलेले पोट आणि डाव्या हातात कवटी धरलेली एक संतप्त पुरुष आकृती दाखवली आहे.
    प्रवेशद्वार तुलनेने छोटे आहे, प्रवेश करणासाठी आपल्याला नतमस्तक व्हावे लागेल अशी व्यवस्था आहे.
दोन मीटर उंच गोलाकार मंदिराच्या भिंतीचा बाहेरील भाग तुलनेने साधा आहे, त्यात कात्यायनी प्रतिमा असलेले कोनाडे आहेत. प्रत्येक कातयानी प्रतिमेच्या पायथ्याशी एक शिर दाखवले आहे, हे बहुतेक डोकी प्राण्यांची आहेत त्यात ही बहुतेक कुत्र्यांची डोकी आहेत. सामान्यत: मृतदेहांच्या जवळ आढळणारे प्राणी कोरले आहेत असे दिसते. सर्व कात्यायनीने काही ना काही शस्त्र धारण केले आहे,  त्यांच्या डोक्यावर एक छत्र दाखवले आहे.
     वरुन खुल्या असणार्‍या मंदिराच्या आत, मंदिराच्या भिंतीच्या आतील बाजूस जमिनीच्या पातळीच्या अगदी वर 60 समान अंतरावर कोनाडे आहेत, प्रत्येकामध्ये एक उभे असलेले विलक्षण सुंदर स्त्री शिल्प (योगिनी) आहे. या शिल्पांचे अतिशय बारकाईने कोरीवकाम केलेले दिसते. बहुतेक सर्व योगिनींच्या मुखावर स्मित विलसत आहे. या सर्व योगिनी त्यांच्या वाहनावर उभ्या दाखवल्या आहेत. हि वाहन म्हणजे बहुतेकदा प्राणी, मानवी डोके किंवा राक्षस आहेत.   प्रत्येक मुर्तीची केशरचना, शस्त्र आणि इतर परिधान केलेल्या वस्तु वेगवेगळ्या आहेत.इथल्या कोणत्याही दोन मुर्तीत कोणतेच साम्य नाही. मुख्य म्हणजे तंत्रशास्त्राशी संबंधित इतर मंदिरांप्रमाणे, येथे कामुक कोरीवकाम आढळत नाही.



पिपली :-
   हे भुवनेश्वरजवळील छोटे खेडेगाव आहे. इथे मोठ्या प्रमाणात हस्तकलेच्या वस्तु बनवल्या जातात. त्यामध्ये हँडबॅग, छत्र्या, पादत्राणे,कपडे, वॉल हॅगिंग, उशीचे अभ्रे, बेडशीट, अश्या अनेक वस्तु उत्तम दर्जाच्या मिळतात. पिपली गावात पोहचल्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात दुकाने दिसतात. हस्तकला हा इथला पारंपारिक व्यवसाय आहे. हा अगदी ओडीशावर राजघराणी राज्य करत होती, तेव्हापासून सुरु आहे.बहुतेक राजांनी या व्यवसायाला प्रोत्साहन दिले. इथले कारागिर फुल, पक्षी, जनावर, वृक्ष, सुर्य यांचा पॅटर्न म्हणून वापर करतात. नंतर त्यावर आरसे चिकटवून आणखी सजवले जाते. जर आपल्याला ओडीशातील पारंपारीक वस्तु खरेदी करायच्या असतील तर पिपली गावाला नक्कीच भेट दिली पाहिजे.


कापडी चित्रे
भुवनेश्वरपासून १५- २० किमी. वर आहे. वाटेत धौलीची कलिंग युद्धाची रणभूमी लागली. वाटाड्याने इंग्रजी आणि हिंदीतून व्यवस्थित माहिती दिली. पिपली हे अगदी छोटेसे गाव. रस्त्याच्या दुतर्फा दुकानेच दुकाने. ओदिशी कलावस्तूंची. इथली आठवण म्हणून बहुतेकांनी ओदिशी वस्तूंची खरेदी केली. हे गरीब राज्य असल्यामुळे तशी स्वस्ताई होती. त्यामुळे खरेदीनंतर बसमधला समस्त महिलावर्ग खूष होता. श्रीकृष्ण-बलराम-सुभद्रा या तिघांची एकत्र चित्रे, मूर्त्या बहुतेक वस्तूत. शैली वैशिष्ट्यपूर्ण ओदिशी शैली. उभ्या लंबगोलाकार चेहर्‍यावर वटारलेले टप्पोरे डोळे. एक खास वस्तू म्हणजे अख्ख्या नारळाच्या गुळगुळीत केलेल्या छतात टांगायच्या गोट्यावरील या त्रिमूर्तीची चित्रे. नारलाला प्रथम तैलरंगाचा एक थर देऊन त्यावर तैलरंगातच आकर्षक छटांमध्ये रंगविलेली. तीनधारी नारळाच्या १२० अंशाच्या तीन पृष्ठभागावर प्रत्येकी एक चित्र अशी एकूण तीन चित्रे. नारळ भोवर्‍यासारखा गोल फिरून थांबला तरी एक चित्र आपल्याकडे पाहतेच. नारळ आणि कापडी चित्रे घेतली. काही घरात लावायला तर काही भेट म्हणून द्यायला. ज्यांना ज्यांना दिली त्यांना आवडली. कापडाच्या पॅचवर्कची उभी चित्रे साडॆचार फूट उंच आणि सहा इंच रुंद पण दोन घेतली. पण वेगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण शैलीतली.

पिपली मारुती मांदीर

पिपली मारुती मंदीर

पिपली मारुती मंदीर

पिपली मारुती मंदीर

 पिपलीचे सुंदरसे मारूती मंदीर 

अतरी येथील गरम पाण्याची कुंड :-    
   भुवनेश्वरपासून ३६ कि.मी दुर खोरदा -नयागड या राज्य महामार्गावर हिरव्यागार वनराईत वसलेले अतरी हे गाव गरम पाण्याच्या झर्यासाठी तसेच भगमरीजवळील हटलेश्वर या शिवमंदीरासाठी प्रसिद्द आहे. या गरम पाण्याच्या झर्यामुळे हे गाव प्रसिध्द झाले आहे.  अतरी हे गाव खुर्दापासून १३ कि.मी. आणि बागमरीपासून २ कि.मी.आहे. गावच्या परिसरात पाणथळ जमीन असून जमीनीतून गरम पाण्याच्या झर्याचा उगम झाला आहे.गंधकाच्या उग्र वासामुळे परिसरात फार वस्ती नाही. या पाण्याचे तापमान ५५ डिग्री सेंटीग्रेड असून वर्षभर हे तापमान सारखेच राहते. आजुबाजुच्या जमिनीत अल्युमिनिअमचे खनिज सापडते. 

झर्‍यातून बाहेर येणारे पाणी १० फुट व्यासाच्या आणि १५ फुट खोलीच्या कुंडात साठवले आहे. पाणी अत्यंत स्वच्छ असून तळाशी असलेले दगड्गोटे स्पष्ट दिसतात. या पाण्यात दैवी शक्ती असल्याचे स्थानिकांचे मानने आहे.इथे एखाद्या निपुत्रिक स्त्रीने या पाण्यातील एखादे फळ किंवा खाण्यायोग्य वस्तुचे भक्षण केले तर तीला पुत्रप्राप्ती होते असा समज आहे.या परिसराला भेट देणारे भाविक या कुंडात फोडलेले नारळ, फळे, भुइमुगाच्या शेंगा टाकतात.भल्या पहाटे तीन वाजल्यानंतर निपुत्रिक स्त्रीया इथे येउन पाण्यातील हि फ़ळ शोधून खातात.त्यामुळे मुल होइल अशी या लोकांची समजुत आहे. याशिवाय या पाण्यात इतर औषधी गुण असल्याचे स्थानिकांचे मानने आहे. यासाठी जवळच आंघोळीची व्यवस्था केली आहे.  

 

या गरम पाण्याच्या कुंडाजवळच हटकेश्वराचे मंदिर आहे.भगवान शंकराच्या कृपेमूळेच इथे गरम पाण्याचे झरे आहेत अशी स्थानिकांची समजुत आहे. शिवरात्री आणि मकरसंक्रातीला इथे मोठी जत्रा भरते आणि त्यात पारंपारिक पध्दतीने तयार केलेल्या वस्तु विक्रीसाठी असतात. संक्रातीला इथे जवळपास वीस हजार भाविक भेट देतात. या उत्सवांचे आयोजन स्थानिक उत्सव समिती करते, भाविकांना गरम पाण्याचे स्नान घडावे यासाठी पर्यटन खात्याने इथे कक्ष उभारले आहेत. 

जावे कसे ? :-
     अतरी हे गाव बागमरीपासून २ कि.मी. आहे. खुर्दा-नयागड रस्त्यावर हे गाव आहे. बागमरी ते खुर्दा हे अंतर १३ कि.मी. तर भुवनेश्वर हे अंतर ३६ कि.मी. आहे. भुवनेश्वरवरुन बागमरीला जाण्यासाठी सरकारी आणि खाजगी बस वहातुक आहे. साधारण दर तासाला नयागडला जाण्यासाठी बस उपलब्ध असतात. या बसने बागमरीला उतरल्यावर खाजगी रिक्षाने आपण या गरम पाण्याच्या झर्यांना भेट देउ शकतो.अर्थात स्वतःच्या भाड्याच्या वहानाने जाणेही सोयीचे पडते.

उदयगिरी, खंडागिरी लेण्या :-

  ओडिशा राज्याचाला पाचशे किलोमीटरचे समुद्रे किनारा लाभला असून अनेक सुंदर समुद्र किनारे आणि अनेक प्रेक्षणीय स्थळांकरिता जगभर प्रसिद्ध आहे. तसेच आशियातील सर्वात मोठे खार पाण्याचे तलाव 'चिलका तलाव' देखील या राज्यात आहे. याशिवाय प्राचीन, ऐतिहासिक आणि पवित्र जगन्नाथ मंदिर  आणि कोणार्क सूर्य मंदिर असे प्रसिध्द पर्यटन स्थळ आहेत. त्याच सोबत ओडिशामध्ये अजून एक पर्यटन स्थळात उदयगिरी आणि खंडागिरीच्या लेण्या आहेत. निसर्गरम्य ओडिशा म्हटले की कोणार्क, जगन्नाथपुरी आणि भुवनेश्वरची मंदिरे डोळ्यासमोर येतात. परंतु याच ओडिशा म्हणजेच प्राचीन कलिंग देशात जैन धर्माचेसुद्धा अस्तित्व होते. त्याच्या पाऊलखुणा आपल्याला त्यांच्या लयनस्थापत्यातून म्हणजेच कोरीव लेणींमधून आजही दिसून येतात. 

 ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्येच जैन लेणींचा एक मोठा समूह आहे. उदयगिरी आणि खंडगिरी लेणी.उदयगिरी म्हणजे सुर्याचा उदय होणारी जागा तर खंडगिरी म्हणजे तुटलेली टेकडी. अतिशय सुंदर, देखण्या आणि ऐतिहासिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या अशा या लेणी आहेत. पर्यटकांसाठी तर हे एक सुंदर ठिकाण आहेच, परंतु अभ्यासकांसाठीसुद्धा हे महत्त्वाचे केंद्र आहे.भारतातील  प्राचीन आणि ऐतिहासिक लेण्यांमध्ये यांचा समावेश होत असून हजारो पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात. 

 उदयगिरी | खंडगिरी

उदयगिरी लेणी

उदयगिरी लेणी डोंगराच्या उजव्या बाजूला आहे. ही लेणी खंडागिरीपेक्षा सुंदर आणि उत्तम आहे. उदयगिरी लेणी जैन भिक्षूंच्या गुरूंचे निवासस्थान असायची. उदयगिरी लेणीमध्ये एकूण 18 लेण्या आहेत, त्यापैकी राणी गुंफा आणि बाजघर गुंफा सर्वात सुंदर परंतु पवित्र मानली जाते. याशिवाय छोटा हाथी गुंपा, अलकापुरी गुंढा, पणसा गुंपा आणि गणेश गुंफा आदी गुंफा प्रसिद्ध आहेत.

खंडागिरी लेणी

खंडागिरीची गुहा डोंगराच्या डाव्या बाजूला असून गुहेभोवती हिरवेगार वातावर आहे. हे वातावर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. खंडागिरी लेणीबद्दल असे म्हटले जाते की जैन धर्माचे शिष्य येथे राहत होते. खंडागिरी लेण्यामध्ये एकूण १५ गुंफा असून त्यामध्ये टाटोवा गुंपा, अनंत गुंपा, ध्यान गुंफा, अंबिका गुंपा आणि नव मुनी गुंफा आदी प्रमुख आहेत. या गुहेत 24 जैन तीर्थंकरांचे पुतळे देखील आहेत.

भेट देण्यासाठी ही आहे योग्य वेळ

इथे जाण्यासाठी तीन ते सहा संध्याकाळी उत्तम वेळ. पिकनिक स्पॅाटच होतो. NH 5 रस्त्यावर बरमन्डा चौकपाशी मोठा आंतरराज्य बस स्टँड आहे. तिथून दीड किमीवर खंडगिरी चौक सिग्नल लागेल. या आतल्या रस्त्यावर दोनशे मिटरसवर डावीकडे खंडगिरी आणि उजवीकडे उदयगिरी डोंगर आहे.
  उदयगिरी, खंडागिरी लेणी परिसराचा नकाशा

भुवनेश्वर शहरापासून  सुमारे सात कि.मी. अंतरावर टेकड्यांवर वसलेल्या या लेण्या आहे. भुवनेश्वरपासून  ईशान्येकडे 95 किमी अंतरात असलेली उदयगिरी, रत्नागिरी आणि ललितगिरी हे बौद्धधर्मिय स्थळांचे संकुल "डायमंड ट्रँगल" बनले आहे.या सर्व एकाच दिवसात भेट देता येते.यातील ओडिशातील उदयगिरी हे सर्वात मोठे बौद्ध संकुल आहे.चला तर मग जाणून घेऊया प्राचिन लेण्यांबद्दल.


इतिहास :-
   भुवनेश्वर शहराजवळच अस्तित्त्वात असलेल्या या लेण्यांचा इतिहास गुप्त काळापासूनचा आहे. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात इथे खारवेल या बलाढय़ सम्राटाची सत्ता होती. त्या खारवेलाचा इतिहास, त्याचे कर्तृत्व आणि त्याचे सामर्थ्य  पल्याला इथे त्यानेच कोरून ठेवलेल्या शिलालेखातून समजून येते. हे शिलालेख म्हणजे तत्कालीन इतिहास आपल्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा करणारा एक चित्रपटच होऊन जातो. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात या शिलालेखांना म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.


    भुवनेश्वरला लागूनच उदयगिरी आणि खंडगिरी या जुळ्या टेकडय़ांवरील जैन लेणी ही यासाठीच महत्त्वाची ठरतात. ही लेणी मुख्यत्वे जैन मुनींच्या निवासासाठी, तसेच प्रार्थना आणि ध्यानधारणेसाठी खोदली गेल्याचे जाणवते. लेण्यांच्या दालनांच्या दरवाज्यावर तोरणे तसेच जैन शुभचिन्हे कोरलेली दिसतात. तसेच राजदरबारातील प्रसंग, राजाची विजयी मिरवणूक, शिकारीचे प्रसंग अशी काही कथन शिल्पे या दालनांच्या दरवाज्यांवर विपुल प्रमाणात कोरलेली आहेत. इथे या जुळ्या डोंगरांवर खोदलेली विविध वैशिष्टय़पूर्ण लेणी आणि या ठिकाणी असलेला तत्कालीन राजा खारवेल याचा शिलालेख या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शिलालेखाची सुरुवात ‘नमो अरिहंतनं.. नमो सव सिधानं’ या जैन नमोकार मंत्रांनी केलेली आहे. १७ ओळींच्या ब्राह्मी लिपीमधील या शिलालेखात अनेक ऐतिहासिक घटनांचे वर्णन आहे.
सम्राट खारवेल आणि लेण्यांचा इतिहास –
    इ.स.पूर्व दुसरे शतक (अंदाजे इ.स.पू १७४) हा सम्राट खारवेलाचा काळ समजला जातो. मगधच्या बलाढय़ मौर्य राजवंशाचा हा अवनतीचा काळ आहे. महाराष्ट्रात याच काळात सातवाहन राजवंशाचे राज्य होते. त्याच सुमारास ओडिशामध्ये चेदी राजवंश उदयाला आला. त्यांचे मूळस्थान चेदी जनपद म्हणजेच आताचे बुंदेलखंड हे होते. खारवेल हा याच राजवंशातला कर्तृत्ववान राजा. त्याला कलिंगचक्रवर्ती असे संबोधले जात असे.

खरवेला शिलालेखाचा स्पष्टपणा कालाच्या आघाताने धूसर झाल्याने पुरातत्त्व खात्याने तिथे एका ठिकाणी लेखन पाट्या लावल्या आहेत॥ परंतू त्यासुद्धा उन्हापावसात उघड्याच ठेवल्याने पुसट झाल्या. संगमरवर फारच लवकर झिजते. लेख १७ ओळींचा होता.

 

शिलालेखात एक महत्त्वाची नोंद सापडते ती म्हणजे, पूर्वी मगध नरेश नंद याने कलिंगावर विजय मिळवून तिथली जिनमूर्ती विजयचिन्ह म्हणून मगधाला नेली होती. मगधावरील विजयानंतर खारवेलाने ती बृहस्पती मित्राकडून पुन्हा हस्तगत केली. आणि तिची कलिंगात पुन्हा प्रतिष्ठापना केली. भारतीय इतिहासात मूर्तीचा हा सर्वात प्राचीन प्रस्तरलेखीय पुरावा आहे. सम्राट अशोकाच्या कलिंग विजयानंतर प्रथमच खारवेलाने कलिंगला आपले पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले. त्याच्या काळात कलिंगचा समुद्रमार्गे व्यापारसुद्धा खूपच बहरला होता. भारतभरातल्या अनेक जैन मुनींना पंडितांना बोलावून त्याने एक धर्मसंमेलन भरवले होते. त्या प्रसंगी जैनसंघाने खारवेलाला खेमराजा, भिखुराजा व धर्मराजा अशा पदव्या बहाल केल्या.मेघवाहन राजवंशाच्या काळातील या गुंफा असाव्यात असे मानले जाते.या राजघराण्याने इ.स.दुसरे शतक ते पाचवे शतक असे कलिंग म्हणजे सध्याच्या ओडीशावर राज्य केले.या प्राचीन लेण्यांचा शोध १९ व्या शतकात प्रथम ब्रिटीश अधिकारी एंड्रयू स्टर्लिंगने लावला. 












 लेणी दर्शन :-
     उदयगिरी आणि खंडगिरी या शेजारीशेजारी असलेल्या टेकडय़ा आहेत. उदयगिरी लेणीमध्ये 18 लेणी / गुंफा आहेत तर दुसरीकडे खंडागिरी लेणीमध्ये सुमारे १५ गुंफा आहेत.त्यातल्या उदयगिरीवर असलेल्या राणीगुंफा, हाथीगुंफा आणि गणेशगुंफा या लेणी महत्त्वाच्या आहेत. सम्राट खारवेलाचा प्रसिद्ध शिलालेख हाथीगुंफेवरील मोठय़ा खडकावर कोरलेला आहे.


राणीगुंफा म्हणजे एक सुंदर दुमजली दालन आहे. जैन मुनींसाठी बांधलेले हे वसतीगृहच आहे. प्रशस्त व्हरांडा आणि बाजूला असलेल्या लहान लहान खोल्या. इथे बऱ्याच दालनांना बाहेर द्वारपाल दिसतात. मध्यवर्ती विभाग जिथे इतर दोन विभागांशी जोडला गेलेला आहे त्या कोनावर शिल्पपट पाहायला मिळतात. यामधे पशुपक्षी, फळांनी डवरलेली झाडे, आनंदानी बागडणारे हत्ती, वाद्य वाजवणाऱ्या सुंदरी इत्यादी शिल्पे फारच प्रभावशाली कोरलेली आहेत.या दुमजली लेण्यात एकुण ३२ कक्ष आहेत.खालच्या मजल्यावरील कक्षाच्या बाह्य भिंतीवर राजा खारवेलने युध्दात विजय मिळवल्यावर काढलेली मिरवणुक व ती मिरवणुक बघण्यासाठी आपआपल्या घरातून बाहेर डोकावणारे लोक दाखवले आहेत.

 

 

 


        उदयगिरी टेकडीसमोरच आहे खंडगिरी टेकडी. भुवनेश्वरकडून आल्यावर ही टेकडी डाव्या हाताला आहे. इथे वरती चढून जाण्यासाठी मोठय़ा पायऱ्या खोदलेल्या दिसतात. एका ठरावीक उंचीवर गेल्यावर मग इथे गुहा खोदलेल्या दिसतात. खंडगिरीला एकूण १५ लेणी आहेत. खंडगिरी टेकडीची उंची १२३ फूट एवढी असून एका शिलालेखात याचा उल्लेख ‘खंडित गिरी’ असा आला आहे. तिथे एक इंद्रकेसरी गुहा असून त्याच्या मागे असलेल्या गुहेत २४ र्तीथकरांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. उदयगिरीच्या तुलनेत खंडगिरीवरील लेणी या काहीशा कमी शिल्पकाम असलेल्या आणि काहीशा ओबडधोबड वाटतात. इथे असलेल्या गुंफांचे आकारसुद्धा लहान आहेत. याशिवाय इथे असलेल्या व्याघ्र आणि सर्प गुंफा या त्यांच्या विशिष्ट आकारामुळे प्रसिद्ध आहेत. या टेकडीच्या माथ्यावरून भुवनेश्वरचा सगळा परिसर नजरेस पडतो. पुरातत्त्व खात्याने हा सगळा परिसर अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे. ओडिशाच्या भटकंतीमध्ये उदयगिरी-खंडगिरी लेण्यांना भेट देऊन प्राचीन इतिहास आणि एका समृद्ध वारशाची ओळख करून घेणे अनिवार्य आहे.


 उदयगिरी लेणी :-

      उदयगिरी लेणी डोंगराच्या उजव्या बाजूला आहे. ही लेणी खंडागिरीपेक्षा सुंदर आणि उत्तम आहे. उदयगिरी लेणी जैन भिक्षूंच्या गुरूंचे निवासस्थान असायची. उदयगिरी लेणीमध्ये एकूण 18 लेण्या आहेत, त्यापैकी राणी गुंफा आणि बाजघर गुंफा सर्वात सुंदर परंतु पवित्र मानली जाते. याशिवाय छोटा हाथी गुंफा, अलकापुरी गुंफा, पणसा गुंफा आणि गणेश गुंफा आदी गुंफा प्रसिद्ध आहेत. इथे १९८५ ते २००४ दरम्यान उत्खनन झाले.
   इथे आल्यावर पार्किंगमधून लेण्यांच्या दिशेने चालल्यावर एक संग्रहालय लागते.इथे काही शिल्प प्रदर्शित केली आहेत.इथून डावीकडे थोड्या अंतरावर एक बारव किंवा पायर्याची विहीर आहे. त्यावर असलेल्या शिलालेखाच्या उल्लेखाप्रमाणे हि विहीर इ.स.१० व्या शतकात बांधली गेली आहे. या विहिरीतील पाणी कधीच आटले नसल्याचा येथील स्थानिकांचा दावा आहे. इथून डावीकडे जाणारा रस्ता खंडगिरी लेण्यांकडे जातो तर सरळ जाणारा रस्ता उदयगिरी लेण्यांकडे जातो. 
 आपण आधी उदयगिरी लेण्यांतील एकेक गुंफेची माहिती घेउया.
गुहा १० : गणेश गुंफा
हि गुंफा आता बरीचशी उद्ध्वस्त झालेली आहे.

su2.jpg

su1.jpg

या गुंफेला गणेश गुंफा म्हणतात.इथल्या प्रांगणात हत्तीची शिल्प आहेत, तसेच मागच्या भिंतीवर गणेशाची प्रतिमा कोरली आहे.


वाघ गुंफा :-
  या गुंफेचा मुखाकडचा भाग एका वाघाच्या जबड्यासारखा कोरला आहे, म्हणून या गुंफेला हे नाव पडले आहे.

su3.jpg

हाथी गुंफा :- 

या लेण्याला हे नाव पडण्याचे कारण म्हणजे या लेण्याचा प्रचंड आकार. या गुहेत विशेष कोरीवकाम नाही ,मात्र इथे शिलालेख पहायला मिळतात. या शिलालेखांमुळे आपल्याला राजा खारवेलची माहिती मिळते.शिलालेखांची सुरवातच नमोकार मंत्राने होते. यातुन असा निष्कर्श निघतो कि राजा खारवेलच्या काळात जैन धर्मच या राज्याचा प्रमुख धर्म होता. 











खंडागिरी लेणी :-
        खंडागिरीची गुहा डोंगराच्या डाव्या बाजूला असून गुहेभोवती हिरवेगार झाडी आणि आल्हादायक वातावरण आहे. यामुळे पर्यटकां इथे भेट देतात. खंडागिरी लेणीबद्दल असे म्हटले जाते की जैन धर्माचे शिष्य येथे राहत होते. हा लेणीसमुह उदयगिरी लेण्यांच्या अगदी समोर आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या या खंडगिरी लेणीमध्ये एकूण १५ लेणी आहेत आणि असे मानले जाते की येथे उत्खनन उदयगिरीपेक्षा थोडे अधिक केले गेले आहे. तसेच या लेणीसमुहामध्ये वावर देखील उदयगिरीच्या तुलनेत बराच काळ होता. उदयगिरी येथील शेवटचा शिलालेख इसवी सन १२ व्या शतकातील आहे, परंतु खंडगिरी लेणींना जैन तीर्थ म्हणून महत्त्व प्राप्त झाले, जे आजही आहे. इसवी सन ११ व्या शतकात सोमवंशी घराण्यातील उद्योतकेशरी यांच्या कारकिर्दीत या लेण्यांचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आले. खंडगिरी म्हणजे “तुटलेली टेकडी”, जे सध्यातरी या परिसरासाठी अतिशय योग्य नाव आहे. खंडगिरी आणि उदयगिरी या दोन लेणीसमुहांना एकाच दिवशी भेट देणार्‍या कोणत्याही व्यक्तीला हि दोन्ही ठिकाणे किती वेगळे आहेत ते लगेच लक्षात येईल. जरी तुम्ही उदयगिरीसाठी तिकीट खरेदी केलेले असेल तर तेच खंडगिरी लेण्यांना भेट देण्यासाठी देखील वापरता येते. मात्र खंडगिरी येथे तुमचे तिकीट तपासले जात नाही
महा स्तूप (महास्तुप) बघून आपण उदयगिरीकडे जाउ शकतो. उदयगिरी परिसरात दोन मठ व इतर बर्‍याच वास्तु आहेत.असे मानले जाते की इथल्या काही वास्तू इ.स.पू. पहिल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील असू शकतात, चौथ्या आणि सातव्या शतकाच्या दरम्यान इमारतींच्या संख्येत आणखी वाढ झाली. त्यानंतर 12 व्या शतकापर्यंत या परिसरात आणखी वाढ, बदल आणि विस्तार चालू राहिला.
   जेव्हा या परिसरात 1997 आणि 2000 च्या दरम्यान  उत्खनन झाले, त्यामध्ये 13 कक्षांनी वेढलेले मध्यवर्ती अंगण असलेले दुमजली विटांनी बांधलेली वास्तु दिसून आली.
उत्तराभिमुख मंदिरात एक मोठा आसनस्थ बुद्ध आहे.आता असलेला मंदिराचा दरवाजा हा पुनर्बांधणी करुन नवीन बसवला आहे, मूळ दरवाजा जो उदयगिरी मधील दरवाजासारखा आहे तो पाटणा संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.
 
 
 
 
 
 उदयगिरी  येथे सापडलेलल्या भाजलेल्या वीटांमुळे असा निष्कर्श काढता येईल की हे ठिकाण मूळतः सिंहप्रस्थ महाविहार म्हणून ओळखले जात होते. मठाच्या खाली सपाट जमिनीवर मोठ्या संख्येने विटांनी बांधलेले उध्वस्त स्तूप आहेत, त्यांच्याभोवती भिंतींच्या आवारात मध्यम आणि लहान आकाराचे कोरीव स्तुप आहेत.
याखेरीज या संकुलात आणखी तीन स्थाने आहेत.  उदयगिरी 2 पासून एक मार्ग आहे जो दक्षिणेकडे एका टेकडीवर सुमारे 600 मीटर पर्यंत जातो तिथे काही दगडी बौद्ध शिल्पे आहेत.
उदयगिरी २ येथील तटबंदीच्या स्तूपाच्या पूर्वेला १०० मीटर अंतरावर एका छोट्या निवासी संकुलाचे अवशेष आहेत.
    कार पार्ककडे परत जाताना उजवीकडे एक खडबडीत रस्ता उत्खनन झालेल्या भागात जातो. अर्थात इथे जांभा दगड खोदून त्यापासून चिरे बनवल्याच्या खुणा दिसतात.यापेक्षा अधिक इथे काही नाही.
    मात्र इथे भेट दिल्यावर खंत जाणवते कि हि परिसर खरोखरच राखला गेला नाही.एकंदरीत या परिसरात स्थानिक लोकांनी केलेला कचरा, गुंफेचा अडोसा घेउन चालणारे अवैध व्यवसाय, नशापान हे सर्व पाहिले कि पुरातत्वखात्याने किती दुर्लक्ष केले आहे ते समजून येते. अर्थातच याचे कारण म्हणजे हा परिसर बंदीस्त नाही कारण या जागेचा वाद जवळपास १०० वर्षे प्रलंबित आहे. या टेकडीच्या माथ्यावर जैन मंदीर आहे.
सन १९१२ मध्ये या परिसराला संरक्षित जागा म्हणून घोषित करण्यात आले आणि तीन वर्षांनंतर १९१५ मध्ये ओरिसाचे आयुक्त हे इथले एकमेव अधिक्षक बनले. पण पुढील ३२ वर्षे हिंदू आणि जैन या दोघांकडूनही अनेक आंदोलने झाली. १९४७ मध्ये परिस्थिती आणखी चिघळली जेव्हा ASI ने जमीन संपादित करण्याची प्रयत्न केला आणि टेकडीच्या पायथ्याशी पूर्वीपासून अस्तित्वात असलेले हिंदू मठ बंद केले. ही टेकडी हिंदू आणि जैन यांच्यासाठी तितकीच पवित्र आहे आणि कदाचित ओडिशातील जैन समुदायासाठी हे सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हा परिसर जवळपासच्या गावातील आणि शहरांतील हिंदू समुदायामध्ये देखील अत्यंत लोकप्रिय असल्याचे दिसते. 

   उदयगिरी लेण्यांकडे चालायला सुरवात केल्यावर सर्वप्रथम आपण एका स्तुपाजवळ पोहचतो. याला महास्तुप म्हणतात. हा पाच मीटर उंच आहे.इथे मधोमध बुद्धाशी संबधीत वस्तु ठेवतात. येथे उत्खननादरम्यान "श्री माधवपुरा महाविहारिया आर्यभिक्षु संघस्य" असा शिलालेख असलेले अनेक टेराकोटा खंड सापडला , त्यामुळे या वस्तीचे मूळ नाव माधवपुरा महाविहारिया असल्याचे जवळपास निश्चित झाले.
 इथे एक काहीसे वेगळेच असे एक शिल्प उभे ठेवले आहे. ते उत्खनन करताना ज्या जागी सापडले त्यापासून फार दूर ठेवले नाही.
 
 
 
 
   पुढे सरळ चालत राहिलो कि एका पुर्वाभिमुख वीटांनी बांधलेल्या वास्तुच्या अवशेषासमोर आपण येउन पोहचतो. हा पहिला मठ म्हणता येईल. सध्या हा भग्नावस्थेत आहे. मधोमध अंगण असून दोन्ही बाजुला खोल्या दिसतात. मुख्य मंदीर मधोमध समोर आहे. हे लाल वीटांनी बांधलेले आहे. आज या वास्तुचा तळमजला शिल्लक आहे.वरच्या मजल्याची रचना कशी असेल हे समजत नाही. 
 
 
 
 
 

 
 
 


 
 
 
 
 
 
 
 
  हि वास्तु इ.स. ८ व्या शतकात बांधली असावी असे मानले जाते.कदाचित आधीच अस्तित्वात असलेल्या वास्तुचे पुनर्निमाण असावे अशीही शक्यता आहे. इथल्या दरवाज्यावरचे नाजुक कोरीवकाम थक्क करते. बारकाईने केलेले काम आणि शिल्पाकृतींच्या चेहर्‍यावरील हावभाव आपल्याला थक्क करतात. या कलाकारांचे कौतुक वाटते.या मंदीराच्या आत गौतम बुध्दाची बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा आहे. अर्थात हे मंदीर कुलुपबंद अवस्थेत आणि अंधारे असल्याने नीट दर्शन होत नाही.  
गुहा 1 : तातोवा गुंफा I
    दरवाज्यांच्या कमानींवर पोपटांच्या कोरीव कामावरून या गुहेला हे नाव मिळालेले आहे.या गुंफेत दोन प्रवेशद्वारांसह एकच कक्ष आहे. गुहेच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आहेत.
या गुहेत सापडलेला एक शिलालेख असा आहे:
    " कुसुमाची गुहा, पदमुलिकाची रहिवासी "
 
 गुहा २ : तातोवा गुंफा II
  या गुंफेच्या द्वारावर देखील पोपटांच्या प्रतिमा कोरलेल्या असल्याने, गुहा 2 हे नाव दिलेले आहे. ही गुहा मोठी आहे आणि अधिक सुशोभित केलेली आहे. दरवाजाच्या चौकटी आणि वरील तोरण यातील जागा कोरीवकाम केलेली असून बाकीच्या लेण्यापेक्षा हि रचना वेगळी आहे. येथे बाहेरील दरवाजांवर कमळाच्या माळा दिसतात, मध्यवर्ती प्रवेशद्वार मधमाश्यांच्या पोळ्यासारखे कोरीवकाम दिसते.

 
 
    गुंफेच्या आतील भिंतीवर एक अत्यंत खराब झालेला अवस्थेतील ब्राह्मी शिलालेख दिसतो, लिपीची शैली इ.स.पूर्व 1 ले शतक ते इसवी सन 1 ले शतक दरम्यानची असावी.तसेच सिंह आणि हत्तींच्या शिल्पांचे कोरीवकाम दिसते.
गुहा 3 : अनंता गुंफा
    या लेणीसमुहातील एक आकर्षक गुंफा. लेणी बघायला फार वेळ आपल्याकडे नसेल तर किमान या लेण्याला भेट द्यायला हवी.
आतील कक्षाला मुळात चार दरवाजे होते, परंतु यापैकी दोन आता अस्तित्वात नाहीत.मात्र ही एक खंत करावी अशी गोष्ट आहे कारण या गुहेतील शिल्पकाम लक्षणीय आहे. कक्षाच्या मागील भिंतीवर एका जैन तीर्थंकरचे शिल्प आणि काही चिन्ह दिसतात, हे सर्व मध्ययुगीन काळातील आहेत.

    कक्षाच्या दरवाज्यावर  एकमेकांत गुंफलेल्या नागाच्या शेपटींनी शिल्प कोरलेले आहेत, ज्यामुळे कमानी तयार होतात. नागाला तीन डोकी कोरलेली आहेत ज्यामुळे या गुहेला हे नाव मिळाले आहे. गुहा २ प्रमाणे, दरवाज्याच्या वरच्या भागाच्या कमानीच्या खाली असलेली जागा विविध शिल्पांनी कोरलेली आहे.
 

 

 
 
   पहिला प्रवेशद्वारावर हत्तींचे शिल्प दिसतात.मात्र आता हि भग्नावस्थेत आहेत.यातील एकाला चार दात दिसतात. डावीकडील हत्ती उजवीकडील हत्तीला कमळ अर्पण करीत आहे. जर दरवाजा पूर्णपणे सुस्थितीत असता तर आपल्याला या शिल्पांमुळे हे द्वार जणु हे हत्ती संरक्षित करीत आहेत असा आभास झाला असता.
    पुढे निघालो कि पुढील शिल्पपट देखील भग्नावस्थेत असल्याचे दिसते. यात पगडी घातलेला एक माणूस आणि त्याच्यावर छत्र दाखवले आहे. तो चार घोडे असलेल्या रथावर बसलेला दिसतो. त्याच्या वर आणि आजूबाजूला सूर्य, चंद्र आणि एक तारा कोरण्यात आला आहे. पुरुषाला दोन स्त्रिया आहेत.काही अभ्यासकांच्या मते हे शिल्प सूर्य (सूर्य देव) असावे असे मानले आहे, ज्यात त्याच्या दोन पत्नी, छाया आणि संध्या दाखवल्या आहेत. पण येथे प्रश्न असा आहे की जर हा सूर्य असेल तर रथाला सात ऐवजी चार घोडे का आहेत?
    याच्या पुढील शिल्पपटात गजांतलक्ष्मी दाखवलेली आहे. यात लक्ष्मी मध्यभागी कमळावर उभी असलेली, तिच्या दोन्ही हातात कमळाचे फूल धरलेले दिसते.तिच्या पाठीमागे दोन हत्ती आहेत जे तिच्यावर पाणी ओतताना दिसतात आणि दोन्ही हत्तींच्या मागे पोपट कोरलेले आहेत. जे गजांतलक्ष्मीचे शिल्प अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध लेण्यांमध्ये दिसते.
 पुढील चौथ्या शिल्पपटात एका कुंपणाच्या आत एका झाडाभोवती चार लोकांचा समूह दर्शविला आहे असेच शिल्प गुंफा ५ ( जयविजय लेणे ) मध्येही पहायला मिळते.
गुहा ४ : तेंतुली गुंफा
या गुहेचे नाव एका चिंचेच्या झाडावरून ठेवले गेले आहे.हे झाड एके काळी याच गुंफेजवळ उभे होते परंतु आता ते अस्तित्वात नाही. यात दोन प्रवेशद्वारांसह एक लहान कक्ष आहे,इथे एक शिल्प असून त्यात मधोमध एक स्त्री हातात कमळ धारण करुन उभी आहे तर बाजुला हत्ती आणि सिंह दाखवले आहेत.

 
 


 
 
गुहा ५ : खंडगिरी गुंफा
   भग्नावस्थेत असल्यामुळे या गुहेला हे नाव दिलेले आहे. ही दुमजली गुहा असून आपण फक्त तळमजलाच बघु शकतो.वरच्या मजल्यावर जाणे सोपे नाही.तसेही इथे फार प्रेक्षणीय काही नाही.

 
गुहा ६ : ध्यान गुंफा
   इथल्या मुळ गुंफेची रचना वेगळी होती असे दिसते. आधीच्या खोदकामात इथे खांब आणि व्हरांडा होता.मात्र नंतरच्या कोरीवकामात त्यात बदल करुन इथे प्रशस्त सभामंडपात रुपांतरीत केलेला दिसतो.
गुहा ७ : नवमुनी गुंफा
     गुहा ६ प्रमाणेच, ही गुहा मूळ स्वरुपातून रुपांतरीत केलेली दिसते.यात मध्ये असलेली भिंत काढून टाकून दोन कक्ष आणि समोर ओसरी कोरलेली दिसते.बहुधा जैन तीर्थंकरांच्या असंख्य मुर्ती कोरण्यासाठी जागा हवी असल्यामुळे हा बदल केला गेला असावा. या गुंफेच्या मागील आणि बाजूच्या भिंतींवर नव म्हणजे नउ मुनींच्या प्रतिमा कोरल्या आहेत.त्यामुळे गुहेला नवमुनी गुंफा हे नाव दिले गेले आहे.


 
 
 यात मागील भिंतीवर वरच्या रांगेत सात तीर्थंकर प्रतिमा आहेत (ऋषभनाथ, अजितनाथ, सम्भवनाथ, अभिनंदननाथ, वासुपूज्य, पार्श्वनाथ आणि नेमिनाथ). तर खालील ओळीमध्ये अगदी डावीकडे गणेश आहे, त्यानंतर तीर्थंकर  (चक्रेश्वरी, रोहिणी, प्रज्ञाप्ती, वज्रश्रींखला, गांधारी, पद्मावती आणि आमरा) आहेत.तसेच उजव्या हाताच्या भिंतीवर पार्श्वनाथ आणि ऋषभनाथाचे शिल्प कोरलेले आहे. या गुहेत एकूण पाच शिलालेख आहेत, त्यापैकी दोन सोमवमशी वंशाचा राजा उद्योतकेसरी (सुमारे ११ वे शतक) याच्या काळातील आहेत.
गुहा ८ : बाराभुजी गुंफा
गुहे क्र.७ सारख्या इथेही अनेक जैन प्रतिमा कोरलेल्या आहेत.या गुहेला हे नाव पडण्याचे कारण म्हणजे या गुंफेत बारा देवींच्या प्रतिमा कोरल्या आहेत.
गुहा ९ : ट्रुसुला गुंफा
  या गुहेत काही जैन कोरीव शिल्पे दिसतात, जी कदाचित इसवी सनाच्या १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात कोरली असावीत असे मानले जाते.
गुंफा १० ( अंबिका गुंफा ):-
गुहा ११ : ललतेंदु केशरी गुंफा
या गुहेत काही जैन शिल्पकाम आहे.
गुहा १२ आणि १३ : नाव दिलेले नाही
इथे विशेष प्रेक्षणीय काही नाही.
गुहा १४ : एकादशी गुंफा
हि गुंफासुध्दा भग्नावस्थेत असून इथे पहाण्यासारखे काही नाही.
गुहा १५ :
या गुंफेच्या जवळ पाण्याचा एक छोटासा तलाव आहे.
खंडगिरी परिसरात ऋषभनाथांना समर्पित केलेले मंदिर आहे.हे मंदीर मुळ मंदिराला पाडून उभारले आहे.इथून फार मोठा परिसर दृष्टीपथात येतो. उद्यगिरी, खंडगिरी या दोन्ही  लेण्यातील शिलालेख ब्राम्ही लिपीत आहेत.यातील बहुतेक शिलालेखाचे वाचन झाले आहे. भारतिय द्वीपकल्पाचा विचार केला तर जैन लेणी खुप कमी संख्येने आहेत.त्यामुळे ओडिशाला भेट देणार्‍या पर्यटकांनी या गुंफाना अवश्य भेट दिली पाहिजे. 

धौली :-

   इ.स.पू. तिसर्या शतकात सम्राट अशोकाने कलिंग राज्यावर आक्रमण केलं. कलिंगातल्या नागरिकांना आपलं सार्वभौमत्व प्रिय होतं. त्यांनी प्राणपणाने अशोकाला प्रतिकार केला. घनघोर युद्ध झालं. रक्ताचे पाट वाहिले. भयंकर नरसंहार झाला. हा सगळा विध्वंस बघून अशोकाला युद्धाची किळस आली. पश्चात्ताप झाला. बौद्ध धर्माशी त्याचा आधीपासून परिचय होताच. या युद्धानंतर झालेल्या नवीन जाणिवेमुळे तो बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडे ओढला गेला आणि त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. (काही इतिहासकारांचे असे मत आहे की बौद्ध धर्मीय प्रजेची संख्या तेव्हा सर्वात जास्त प्रमाणात होती म्हणून परधर्मी राजा त्या प्रजेला चालणार नाही तेव्हा लोकांचा धार्मिक उठाव टाळायला त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. हेच कारण जास्त तार्किक वाटते.)ही कथा आपल्याला माहिती असते. हे युद्ध ज्या परिसरात झालं आणि अशोकाला ही जाणीव ज्या परिसरात झाली, त्या ठिकाणी १९७२ मध्ये जपान आणि भारताने संयुक्तरीत्या एक शांतीस्तूप उभारला आहे. तेच हे धौली .(ज्याला आंतरराष्ट्रीय शांतता पॅगोडा देखील म्हटले जाते) भुवनेश्वरच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर धौली टेकडीच्या माथ्यावर हे ठिजाण आहे,धौलीच्या पायथ्याशी अशोकाचा एक शिलालेख आहे. एका मोठ्या खडकावर ब्राह्मी लिपीत तो कोरलेला आहे. सम्राट अशोकाच्या महत्त्वाच्या शिलालेखांपैकी तो एक आहे.




        शांती स्तूपामध्ये भगवान बुद्धांच्या विविध आसनांमध्ये चार भव्य मूर्ती आहेत, तसेच त्यांच्या जीवनातील प्रसंगांची मालिका दगडी शिल्पपटात कोरलेल्या  आहेत . यामध्ये धौली परिसरातील युध्दभुमीवर झालेल्या लढाईनंतरचे आणि अशोकाच्या हिंसक मार्गापासून दूर जाण्याचे प्रसंग कोरले आहेत.
 तिथे बुद्धाची एक सुंदरशी मुख्य मूर्ती आहे आणि चारी बाजूंना अजून लहान लहान बुद्धमूर्ती आहेत. समोरच्या बाजूला दोन ऐटदार सिंह आहेत. ( एकूणच तिथे सगळीकडे सिंहाची शिल्पं खूप दिसली) एखाद्या ठिकाणी घडलेला इतिहास त्या ठिकाणाला वेगळंच महत्त्व प्राप्त करून देतो. हा स्तूप काही ऐतिहासिक नाही. अगदीच अलीकडचा, आधुनिक काळातला. पण त्याच्या पार्श्वभूमीमुळे आपली दृष्टी पूर्णपणे बदलते. इथेच एक अशोकस्तंभ उभारला आहे.मात्र याची कारागिरी सामान्य वाटते.

dhauli.png

ही मुख्य बुद्धमूर्ती

शांतीस्तूप

हा फोटोग्राफीचा एक प्रयत्न

   त्याच स्तूपाच्या पार्श्वभूमीवर एक उत्कृष्ट दृकश्राव्य शो तिथे असतो. तोही पाहण्यासारखा आहे.ओम पुरीच्या घनगंभीर आवाजातलं निवेदन असलेला तो शो पाहणं हा अतिशय संस्मरणीय अनुभव असतो.


धौलीचा स्तूप

  धौलीमध्ये पाहण्यासारखी इतर ठिकाणे आहेत , विशेषत: अशोकन रॉक एडिट , परंतु आणखी एक ठिकाण म्हणजे भैरंगेश्वर मंदिर ज्याला खुप कमी लोक भेट देतात . तुम्हाला भुवनेश्वर शहरापासून जवळच एक कमी वेळाची सहल करायची असल्यास धौली हा एक चांगला पर्याय आहे.

चंदका वन्यजीव अभयारण्य :-

 भुवनेश्वरच्या वायव्येला असलेले चंडका वन्यजीव अभयारण्य जवळपास १७६ स्क्वे.कि.मी. परिसरात पसरलेले आहे. मोठ्या प्रमाणात झाडे,झुडपे आणि प्राणी असणार्‍या या परिसराला सन १९८२ मध्ये हत्तीसांठी राखीव वनक्षेत्र म्हणून घोषीत केले गेले. इथे बर्याच दुर्मिळ वनस्पती आहेत.हत्ती हा इथला मुख्य प्राणी आहे. याशिवाय या जंगलात बिबट्या, भेकर, रानडुक्कर, खवल्या मांजर, कोल्हे असे अनेक वन्यजीव बघायला मिळतात. त्याचबरोबर इथे पक्षी मोठ्या संख्येने आहेत. तसेच सरपटणारे जीव ही इथे बघायला मिळतात. वन्य प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी इथे वॉच टॉवर उभारला आहे. या वन परिक्षेत्रात देराज डॅम आणि झुमका डॅम अशी दोन धरणे आहेत. धरणांच्या काठावर रहाण्यासाठी कॉटेज आहेत. देराज डॅम हे ओरिसातील तिसर्‍या क्रमांकाचे धरण आहे.याच्याजवळ असलेल्या टेकडीच्या माथ्यावर विश्रामगृहाची उभारणी केली आहे. या धरणाच्या आजुबाजुच्या चाळीस कि.मी. परिसरात सफारीची व्यवस्था आहे. एक दिवसाच्या पिकनिक्साठी हा परिसर उत्तम आहे. 



ओडिशा पर्यंत कसे पोहोचावे – how to reach odisha 

  • रस्त्याने

ओडिशा (ओरिसा) देशाच्या इतर भागांशी रस्त्याने खूप चांगले जोडलेले आहे. सर्व शहरांच्या प्रवासासाठी तुम्हाला टॅक्सी आणि बस सहज मिळू शकतात.

  • रेल्वेद्वारे

ओडिशा (ओरिसा) त्याच्या रेल्वे नेटवर्कद्वारे संपूर्ण भारतात जोडलेले आहे. भारतातील सर्व मेट्रो शहरांसाठी गाड्या येथून धावतात.

  • विमानाने

भुवनेश्वर येथील बिजू पटनायक विमानतळ ओडिशा (ओरिसा) पर्यंत हवाई मार्गाने जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. विमानतळ दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई सारख्या भारताच्या विविध शहरांशी चांगले जोडलेले आहे.

कसे जाल:-

विमान सेवा:-

भुवनेश्वर ही नवी दिल्ली, कोलकाता, विशाखापट्टणम, चेन्नई आणि मुंबई यासारख्या प्रमुख भारतीय शहरांच्या विमानाने चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. भुवनेश्वरला इंडिगो, गो एअर, एअर इंडिया सारख्या सर्व प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांकडून दररोज उड्डाणे आहेत. 

रेल्वे सेवा:-

पुरी हा दक्षिण पूर्व रेल्वेचा शेवटचा बिंदू आहे. पुरी आणि भुवनेश्वर ते कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई आणि देशातील इतर प्रमुख शहरे आणि शहरांमध्ये जलद आणि सुपरफास्ट गाड्या आहेत ज्याद्वारे तुम्ही येथे आल्यानंतर टॅक्सी किंवा बसने कोणार्कला पोहोचू शकता.

रस्ता सेवा:- 

सार्वजनिक वाहतुकीव्यतिरिक्त, खाजगी पर्यटक बस सेवा आणि टॅक्सी देखील पुरी आणि भुवनेश्वर येथून उपलब्ध आहेत.

भुबनेश्वर किंवा त्रिभुबनेश्वर ही ओडिशा राज्याची राजधानी स्वातंत्र्यानंतर झाली. अगोदर कटक होती ती महानदीच्या बेटावर असल्याने जागा अपुरी पडू लागली. ब्रिटिशांनी ही भुबनेश्वरची जागा नियोजित करून बांधायला घेतली. रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागात जुने शहर होते तिथूनच कटक - पुरी रस्ता(NH 203) जातो. पश्चिम भाग हा नवीन भाग. इथे तीन किमिवर विमानतळ, पाच किमिवर मोठा बस स्टँड आहे.( NH 5 ) रस्ते मोठे आणि दोन्ही बाजूस सुंदर इमारती दिसतात. साठ किमिवरच्या जगन्नाथपुरी आणि कोनार्क येथे जाण्यासाठी हे मुख्य शहर असले तरी भुबनेश्वरला स्वत:चे असे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व होतेच. ती सर्व माहिती विकिलेखांत सापडेल.

डिसेंबरमध्ये केलेल्या पुरी यात्रेच्यावेळी इथले स्थळदर्शन झाले त्याचे थोडक्यात फोटो आणि माहिती देत आहे. पुढे कोणास जाताना टुअर नियोजनास थोडीफार उपयोगी पडेल अशी आशा आहे. भुबनेश्वर -पिपली - साक्षीगोपाल - पुरी - कोनार्क - परत अशी कार हायर करणारे बरेच आहेत.
प्रमुख स्थळे, अंतर
१) उदयगिरी - खंडगिरी

२ ) धौली
कलिंग विजयानंतर अशोकाने येथे बौद्ध धर्म स्विकारला. पुरी रस्त्यावर आठ किमिवर आहे.
३ ) नंदनकानन प्राणी संग्रहालय
उत्तरेस वीस किमिटरस कटकजवळ.

४ ) बिंदुसागर तलाव आणि परिसर मंदिरे
स्टेशनपासून अडीच किमिवर जुन्या गावात.

५ ) म्यूजियम
स्टेशनपासून १ किमि कल्पना चौक, बिंदुसागर अगोदर. काही चांगल्या मूर्ती ठेवल्या आहेत.
बिंदुसागर तलाव आणि त्याभोवती पसरलेली पन्नासेक मंदिरे सातव्या ते तेराव्या शतकांतील आहेत. यांमध्ये लिंगराज मंदिरात आणि अनंत बसुदेवमध्ये पूजा होते. लिंगराज भव्य आहे. अनंत बसुदेव अगदी बिंदुसागरसमोरच आहे.
६ ) चिलिका सरोवर
शंभर किमि दक्षिणेस.
पिपली, नंदनकानन आणि धौली येथे गेलो नव्हतो.
चिलिका सरोवर येथून शंभर किमि दक्षिणेस आहे. हिवाळ्यात येथे स्थलांतरीत पक्षी येतात. या नावाचे स्टेशनही आहे. सरोवर सत्तर किमि लांबीला आहे आणि रेल्वे ,इस्टकोस्ट हाइवे बाजूनेच जातो. इस्टकोस्ट एक्स्पप्रेस (१८६४६) येथून पहाटे पाचवाजता जात होती तेव्हा अतिशय दुर्गंधी येत होती. कशामुळे माहित नाही. पाणपक्षी पाहायचा उत्साह कमी झाल्यामुळे चिलिका वगळले.


कटक : शहरात बाराबाती किल्ला व परिसरातले कटकचंडी चे शक्तीपीठ पाहण्यासारखे आहे. त्याशिवाय जवळच धवलेश्वर नावाचे महानदीतील बेटावरील एक स्थान फार सुंदर आहे. फारसे माहितीतले नसल्याने गर्दी नसते. इथे महानदी दुभंगून पुढे त्रिभुज प्रदेश निर्माण करत पूर्वसमुद्राला मिळते, महानदीच्या विस्तीर्ण पात्रातून नावेने प्रवास हा वेगळाच अनुभव!

जाजपूर : थोडे उत्तरेकडे हे लहानसे शहर, विरजा/बिरजा देवीचे स्थान. ५१ शक्तिपीठांपैकी व त्यातही विशेष महत्वाच्या शक्तिस्थानांपैकी एक.

माहितीत भर आवडली. भारतात पर्यटक यादीत पुरी असते परंतू भुबनेश्वरसाठीही दोन दिवस वेगळे ठेवतील ही अपेक्षा आहे.
इथे सिटीबस सर्विस अपुरी,असमाधनकारक आहे.ओटोवाले फारच पैसे मागतात - दोन किमिसाठी शंभर रु. राजारानी मंदिरपासून खंडगिरी सहा किमि आहे मोठ्या पुलावरून परंतू ६०३ नंबरच्या बसने चांगले पंधरा किमि फिरवून उत्तरेच्या पुलावरून नेले त्यात बराच वेळ वाया गेला.रेल्वे स्टेशनवर वेगळा पादचारी पुल नाही त्यामुळे पटकन इकडून तिकडे जाण्यासाठी प्लॅटफाम तिकिट काढावे लागते.भास्करेश्वर,मेघेश्वर,ब्रम्हेश्वर ही तीनही मंदिरे ( लोनली प्लॅनिट पुस्तकात दिली आहेत.फारनर पुस्तकाच्या पानांच्या फोटोकापी घेऊनच फिरतात.)बघायची राहिली.








 

 

 

 
 
 
 
 
 




























https://inmarathi.net/odisha-information-in-marathi/

https://www.marathimol.in/odisha-information-in-marathi/

https://www.wikimitra.com/odisha-information-in-marathi/
https://vishwakosh.marathi.gov.in/22006/
https://ajaykorane.com/odisha-maharashtra/

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...