टाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर
टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा.

नेहमीच्या ठरावीक पर्यटन स्थळांऐवजी काही तरी वेगळं पाहण्यासाठी कायमच वाट वाकडी करण्याची गरज नसते. कधी कधी महामार्गालगतच थोडं धुंडाळल्यास काही पुरातन ठेवा सापडू शकतो.
अनेक वेळा प्रसिद्ध लेणी, मंदिरं यांबद्दल खूप लिहिलं जातं. प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीतदेखील त्यांचा समावेश असतो. पण, अनेकदा मुख्य मार्गाच्या आसपासची अशी अनेक ठिकाणं असतात त्याबद्दल फारसं काही ऐकायला मिळत नाही. अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वरची लेणी, सोमेश्वर मंदिर आणि जामगावचा किल्ला ही अशीच काही ऐतिहासिक ठिकाणं मुंबई-पुण्याहून एका दिवसातही व्यवस्थित पाहता येणारी. कल्याण-नगर रस्त्यावर नगरच्या अलीकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याणपासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करून पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेणींपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणींपासून पाऊण उंचीवर मध्य युगात बांधलेलं प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला दिसतो. येथूनच पुरावशेष आपलं लक्ष वेधून घेऊ लागतात. पायऱ्या चढताना प्रवेशद्वाराच्या अलीकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरं आहेत. त्यावर दगडी फुलं कोरलेली आहेत. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेलं आहे. हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेव्हा बांधली असेल तेव्हा प्रवेशद्वारावर शरभ शिल्प असणार, पण कालांतराने डागडुजी करताना ते मूळ जागेवरून काढून टाकलं असावं. लेणींच्या पायऱ्या चढताना नक्षीकाम केलेले दगड पायऱ्यांसाठी वापरलेले आढळतात.
टाकळी ढोकेश्वरचं मुख्य लेणं प्रशस्त आहे. लेणीत शिरताना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची मूर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्याच्या दारावर द्वारपालाचं शिल्प आहे. गाभाऱ्यात िपड आणि सभामंडपात नंदी आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ कोरून काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर अनेक वीरगळ ठेवलेल्या आहेत. एक मोठा नंदीही आणि सर्पशिळा येथे ठेवलेल्या आहेत. मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाकेदेखील कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरून काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. फुलझाडांची लागवड करून परिसर सुशोभित केलेला आहे.
टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा. टाकळी ढोकेश्वर ते पारनेर अंतर २५ किलोमीटर आहे. पारनेरच्या पुढे चार किमीवर दोन ओढय़ांच्या संगमावर सोमेश्वर मंदिर आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पराशर ऋषींची तपोभूमी होती असं स्थानिक लोक मानतात. या जागेत सध्या असलेल्या सोमेश्वर मंदिराचं बांधकाम मात्र मध्य युगात झालेलं असावं. मंदिरापर्यंत जाण्यासाठी ओढय़ावर बांधलेला पुल ओलांडावा लागतो. येथे दोन्ही ओढय़ांवर बांधारे बांधून पाणी अडवलेलं आहे. येथून मंदिराचं होणारं प्रथमदर्शन आपल्याला या जागेच्या प्रेमात पाडतं. मंदिरासाठी या जागेची योजना ज्याने केली तो खरेच निसर्गप्रेमी रसिक माणूस असणार. मंदिराच्या प्रांगणात जमिनीवर बांधलेला एक घुमट आहे. घुमटाखाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून गेल्यावर छोटासा काळोखी गाभारा आहे. त्यात िपड आहे. गाभाऱ्यात हवा खेळती राहावी यासाठी छताला झरोके केले आहेत. हे मंदिर खास ध्यानधारणा करण्यासाठी बांधलेलं असावं असं वाटतं. मुख्य मंदिर दगडात बांधलेलं आहे. मंदिराच्या भिंतींवर कोणत्याही प्रकारचं कोरीव काम किंवा मूर्ती नाहीत. मात्र मंदिराच्या परिसरात अनेक जीर्ण मूर्ती व्यवस्थित ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्या जुन्या मंदिराच्या असाव्यात. मंदिर पाहून परत पुलापाशी येऊन मंदिराच्या विरुद्ध दिशेला गेल्यास दगडात बांधलेली सुंदर पुष्कर्णी आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या कमानदार ओवऱ्या पाहायला मिळतात. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काही महिन्यांत हा परिसर नितांतसुंदर दिसतो.
पारनेर तालुक्यातील या दोन ठिकाणांबरोबरच पारनेरपासून १२ किमीवर असलेला जामगावचा भुईकोट किल्ला आणि त्यातील महादजी िशदे यांचा वाडा पाहण्यासारखा आहे. िशदेंनी हा वाडा रयत शिक्षण संस्थेला दान केलेला आहे. या वाडय़ात सध्या डीएड कॉलेज भरते. त्यामुळे वाडा आणि किल्ल्याचा परिसर अजूनही टिकून राहिलेला आहे.
एक दिवसाच्या भटकंतीत काही तरी वेगळं पाहायचं असेल तर हा एक चांगला आणि उत्तम पर्याय म्हणता येईल.
amitssam9@gmail.com
टाकळी ढोकेश्वर लेणी, ता. पारनेर | Discover Maharashtra

टाकळी ढोकेश्वर लेणी, ता. पारनेर –
नगर – कल्याण रस्त्यावर नगरपासून ४० किमी अंतरावर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. महामार्ग सोडून गावात जाणार्या रस्त्याने गाव पार करुन पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वर ची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. लेण्यांपासून पाऊण उंचीवर मध्ययुगात बांधलेले प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरुनच आपले लक्ष वेधून घेतात. पायर्या चढतांना प्रवेशव्दाराच्या अलिकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरे आहेत. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेलं आहे. हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेंव्हा बांधली असेल तेंव्हा त्याच्या बाजूला हे शरभ शिल्प असणार पण कालांतराने डागडूजी करतांना ते मुळ जागेवरून काढून टाकले असावे. अश्या प्रकारचे नक्षीकाम केलेले दगड पायर्या चढतांना पायर्यांमध्येही आढळतात.टाकळी ढोकेश्वर लेणी.
केंद्रीय पुरातत्व विभागाने टाकळी ढोकेश्वर लेणी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. पुरातत्व विभागाच्या नोंदी नुसार ही शैव लेणी राष्ट्रकूटकालीन इ. स. ५ व्या ते ६ व्या शतकातील आहे. टाकळी ढोकेश्वरचे मुख्य लेण प्रशस्त आहे. लेणी समोर दगडी दिपमाळ आपल्याला दिसून येते. लेण्यात शिरतांना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसर्या बाजूला वीरभद्राची मुर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूंना आयुधपुरुष मूर्ती आहेत. पैकी उजवीकडील द्वारपालानजीकची आयुधपुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झाली आहे मात्र डावीकडील पूर्णपणे दृग्गोचर आहे. ती आहे त्रिशुळपुरुषाची. त्रिशुळपुरुषाने हाताची घडी घातली असून मस्तकी त्रिशुळ धारण केला आहे.
गाभार्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस हातात फुले घेतलेल्या दोन द्वारपालांची भव्य शिल्पे असून, त्यांच्या डोक्यामागील प्रभामंडळ आणि त्यांच्या वर असलेले विद्याधर केवळ पाहण्याजोगे आहेत. सभामंडपात नंदी आहेत. सभामंडप आणि अंतराळ ह्यांना विभाजीत करणाऱ्या स्तंभचौकटीवर गजलक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत. गाभार्या भोवती प्रदक्षिणापथ कोरुन काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर एका गुहेत असंख्य शिल्पे मांडून ठेवलेली असून ही गुहा लोखंडी दरवाजाने बंद केलेली असते. तसेच प्रदक्षिणा मार्गावर अनेक वीरगळ, शिवलिंग व मोठा नंदी ठेवलेला आपल्याला दिसून येतो. गर्भगृहात शिवलिंग आहे.
मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरुन काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या कोरलेल्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. फ़ुलझाडांची लागवड करुन परीसर सुशोभित केलेला आहे. या ठिकाणाहून दुरवरचा परिसर दिसतो. महाशिवरात्र, श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. एका दिवसात विशेष ऐतिहासिक वास्तू पाहायची असल्यास टाकळी ढोकेश्वर लेणी हे एक उत्तम ठिकाण आहे.
Rohan Gadekar
https://www.discovermh.com/takli-dhokeshwar-caves/
ढोकेश्वर मंदिर पांडवकालीन स्थापत्य कलेचा चमत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्राचीन व पुरातन देवस्थान श्री ढोकेश्वरची यात्रा तिसऱ्या सोमवारी २३ ऑगस्ट रोजी होती; परंतु कोविडच्या संकटामुळे यंदा ही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यात्रेची गेल्या १०० वर्षांची परंपरा खंडित झाली.
श्री ढोकेश्वरची पुरातन लेणी अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असून इ. स. पूर्व ५५० ते ६०० या कालखंडात ही लेणी तयार झाली असल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. हे मंदिर पुरातन देवस्थान असल्याने येथे नगर व पुणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. विशेषतः श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. सोमवारी दुपारी तीन वाजता यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा आखाडा भरत असतो. या आखाड्यात नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील मल्ल मोठ्या संख्येने हजेरी लावतात. ढोकेश्वरच्या नावाने ओळखला जाणारा हा डोंगर पांडवांनी ५५० ते ६०० या कालखंडात कोरल्याचे संशोधकांचे मत आहे. समुद्र सपाटीपासून अंदाजे १ कि.मी उंचीवर डोंगराच्या मध्यभागी पांडवकाळात ही लेणी कोरण्यात आली आहे. ही लेणी स्थापत्यशास्राचा चमत्कारच आहे. अवघ्या चार स्तंभावर अख्खा डोंगर आजही पेलला आहे. प्रत्येक स्तंभावरील कोरीव काम व सुबक नक्षी पाहणाऱ्यांना अचंबित करते. गाभाऱ्यात महादेवाची मोठी पिंड आहे. प्रवेशद्वारावर जय विजयच्या मूर्ती दिमाखात आहेत. सर्वच देवतांच्या मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला शनीची मूर्ती आहे. दक्षिणेकडील भिंतीवर श्रीगणेशाची व इतर देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या असून, खालच्या बाजूला देवदेवतांची वाहने कोरलेली आहेत. या कोरीव कामाला पौराणिक संदर्भ आहे. शिवभक्ती म्हणून नागदेवता मंदिराच्या उत्तरेला कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभागृहावर अत्यंत देखणे व जाळीदार नक्षीकाम कोरलेले आहे.
महादेवाच्या पिंडीमागे यू आकाराची गुहा आहे. या गुहेतूनच भाविक ढोकेश्वराला हरहर महादेव या जयघोषात प्रदक्षिणा पूर्ण करतात. गाभाऱ्याच्या उत्तरेला भला मोठा नंदी असून, पूर्वेला समोरच नंदी आहे.
----------
पर्यंटकांसाठी पर्वणी
मंदिराच्या बाहेर ईशान्य बाजूला भव्य दीपमाळ असून, ती नेहमी तेवत असते. मंदिरावरील पाणी नैसर्गिकरीत्या पावसाळ्यामध्ये टाक्यात साठवण्याची अफलातून कल्पना या वास्तुशास्रात आहे. उंच डोंगरावर कोरलेल्या या मंदिरामध्ये पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूला सीतेची नान्ही आहे, असे भक्तांचे म्हणणे आहे. सामाजिक वन विभागाने या ठिकाणी लहान मुलांसाठी केलेले खेळणी घर बालकांचे आकर्षण बनले आहे. अनेक शालेय सहलींचे ते आकर्षण ठरले आहे.
https://www.lokmat.com/ahmadnagar/dhokeshwar-temple-miracle-pandava-architecture-a694/
टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला आणि विठठल मंदिर, जामगावचा किल्ला आणि पारनेरचे सोमेश्वर मंदिर (Takali Dhokeshwar, Palashi Fort , Jamgaon Fort & Someshwar Temple , Parner, Dist. Ahmednagar)
![]() |
| सप्तमातृका, टाकळी ढोकेश्वरची लेणी |
![]() |
| टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी |
![]() |
| टाकळी ढोकेश्वर प्रवेशव्दार |
![]() |
| लेण्याचा सभामंडप आणि गर्भगृह,टाकळी ढोकेश्वर |
मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरुन काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या कोरलेल्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे.
![]() |
| पाण्याचे टाके |
![]() |
| सीता न्हाणीला जाण्यासाठी दगडातल्या खोबण्या |
फ़ुलझाडांची लागवड करुन परीसर सुशोभित केलेला आहे. या ठिकाणाहून दुरवरचा परिसर दिसतो. आम्ही लेण्यांच्या परिसरात आलो तेंव्हा तेथे पांढरा लेंगा सदरा घातलेले आजोबा होते. लेण्यांची साफ़सफ़ाई करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अशा स्थानिकांशी गप्पा मारल्यावर अनेक नवीन गोष्टी कळतात असा माझा अनुभव आहे. आजोबांशी संवाद साधायचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तंबाखू आहे का? तो आमच्याकडे नसल्याने त्यांची निराशा झाली आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तर देण्यचे टाळले आणि एका जागी जाऊन चक्क झोपले.
![]() |
| पळशीच्या भुईकोट |
![]() |
| पळशीकरांचा वाडा |
![]() |
| पळशीकरांचा वाडा |
![]() |
| पळशीकरांचा वाडा |
| पळशीकरांचा वाडा |
| लाकडावरील नक्षीकाम , पळशीकरांचा वाडा |
![]() |
| देवघर, पळशीकरांचा वाडा |
वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील खांब पाम वृक्षा सारखे कोरलेले आहेत. वाड्याचा दुसरा मजला कोसळलेला असल्याने त्यावर पत्रे घातलेले आहेत. वाड्याची कुठल्याही प्रकारची निगा न राखल्याने त्याची दुरावस्था झालेली आहे.
वाडा पाहून बाहेर आल्यावर समोर एका दुमजली इमारतीचे अवषेश दिसतात. याठिकाणी दुसरा वाडा होता. या वाड्याच्या दोन भिंती कशाबशा उभ्या आहेत. त्या भिंतीतले कोनाडे पाहाण्यासारखे आहेत. या वाड्याची गावातल्या लोकांनी हागणदरी केलेली आहे. त्यामुळे येथे थोडा वेळ उभ राहाणे कठीण आहे. या दोन वाड्यांच्या मधून एक वाट देवीच्या मंदिराकडे जाते. मंदिरात डोक्यावर नागाचा फ़णा असलेली, हातात चक्र, गदा घेतलेली आणि पायाशी हत्ती असलेली देवीची मुर्ती आहे.
देवीचे मंदिर पाहून पुन्हा महादेव मंदिराच्या चौकात येऊन मंदिराकडे पाठ करुन सरळ चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्व दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या बाहेर थोड्या अंतरावर पळशी नदीचे अरुंद पात्र आहे. दरवाजावर चढून जाण्यासाठी पायर्या आहेत. दरवाजा वरून संपूर्ण किल्ला आणि आजूबाजूचा परीसर दिसतो.
![]() |
| विठ्ठल मंदिर, पळशी |
| व्याल आणि हत्ती, विठ्ठल मंदिर, पळशी |


![]() |
| मुख्य प्रवेशव्दार, जामगावचा भुईकोट |
![]() |
| शिंदेंचा वाडा, जामगाव किल्ला |
![]() |
| सोमेश्वर मंदिर, पारनेर |
![]() |
| पुष्कर्णी, सोमेश्वर मंदिर, पारनेर |
![]() |
| सोमेश्वर मंदिर, पारनेर |
कल्याण - नगर रस्त्यावर टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता (अंतर ३३ किमी) पारनेरला जातो. पारनेरहून १२ किलोमीटरवर जामगावचा किल्ला आहे. कल्याण ते जामगावचा किल्ला हे अंतर २०३ किमी आहे. जामगावचा किल्ला पारनेर जामगाव रस्त्याला लागून आहे. पारनेर गावातून ४ किलोमीटरवर सोमेश्वर मंदिर आहे. (पुणे - शिरुर - जामगावचा किल्ला हे अंतर १०५ किलोमीटर आहे.)
https://samantfort.blogspot.com/2017/11/blog-post.html
टाकळी ढोकेश्वर
प्रकार : शैव लेणी
जिल्हा : अहमदनगर
श्रेणी : सोपी
संपुर्ण भारतात आढळणाऱ्या १२०० लेण्यांपैकी साधारण ८५० लेणी एकटया
महाराष्ट्रात आहेत. हे ऐकायला जरी बरे वाटत असले तरी यातील ३०-४० लेणी
वगळता इतर लेणी अज्ञातवासात आहेत हे वास्तव आहे. अज्ञातवासात असलेल्या या
लेण्यांपैकी एक लेणे म्हणजे टाकळी ढोकेश्वर. अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर
तालुक्यात टाकळी गावात असलेले हे लेणे नगरहुन ४० कि.मी.अंतरावर तर पारनेर
या तालुक्याच्या ठिकाणाहुन २१ कि.मी.अंतरावर आहे. टाकळी गाव ते ढोकेश्वर
लेणी हे अंतर साधारण ५ कि.मी.आहे. कल्याण-नगर महामार्गाने टाकळी गाव पार
केल्यावर महामार्गाच्या डाव्या बाजुस ढोकेश्वरची लेणी असलेली लहानशी टेकडी
दिसते. या टेकडीच्या मध्यातच ढोकेश्वरची शैवलेणी कोरलेली आहेत. लेण्याचा
ताबा पुरातत्व खात्याकडे असुन त्यांनी लेणींपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या
बांधलेल्या आहेत. टेकडीच्या पायथ्यापासुन टेकडीच्या मध्यात असलेले
लेण्याचे प्रवेशद्वार व तटबंदी ठळकपणे दिसुन येते.
पायऱ्यांच्या सुरुवातीला डाव्या बाजुस एक दगडी रांजण पहायला मिळतो. येथुन
साधारण ५०-६० पायऱ्या चढुन गेल्यावर प्रवेशद्वाराआधी उजवीकडे एक समाधी
मंदीर व दुसरा समाधी चौथरा पहायला मिळतो. समाधी मंदीरावर काही प्रमाणात
कोरीवकाम केलेले असुन दरवाजावर गणेशशिल्प कोरलेले आहे. समाधी मंदीराच्या
आतील चौथऱ्यावर शिवलिंग मांडले आहे. बाहेरील दुसऱ्या समाधी चौथऱ्याला
लागुनच एक एक शरभशिल्प ठेवलेले आहे. हे शिल्प बहुधा लेणीच्या तटबंदीतील
असावे. लेणींच्या पायऱ्या चढताना काही ठिकाणी नक्षीकाम केलेले बांधकामातील
दगड पायऱ्यांसाठी वापरलेले दिसुन येतात. तटबंदीमधील दरवाजाने लेण्याच्या
आवारात प्रवेश केल्यावर चौथऱ्यावर उभारलेली दगडी दीपमाळ दिसुन येते.
ढोकेश्वरचं लेणं बऱ्यापैकी मोठे असुन लेण्याच्या दोन्ही बाजूस शालभंजिका
कोरलेल्या आहेत. लेण्याचा आतील सभामंडप चार स्तंभावर तोललेला असुन डाव्या
बाजुस सप्तमातृकापट त्यांच्या वाहनांसह कोरलेला आहे. या पटाच्या एका टोकावर
गणपती तर दुसऱ्या टोकाला वीरभद्र कोरलेला आहे. लेण्यातील एका भिंतीवर झीज
झालेले गजलक्ष्मी शिल्प आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर दोन्ही बाजूस हातात
फुले घेतलेल्या द्वारपाल असुन त्यांच्या डोक्यामागे प्रभामंडळ व
त्यांच्यावर विद्याधर कोरले आहेत. गर्भगृहाला फेरी मारण्यासाठी
प्रदक्षिणापथ कोरलेला असुन गर्भगृहात शिवलिंग व सभामंडपात नंदीची स्थापना
केलेली आहे. या प्रदक्षिणापथावर मोठया प्रमाणात वीरगळ दिसुन येतात.
लेण्याबाहेर डाव्या बाजुला कातळाच्या पोटात कोरलेले पाण्याचे टाके असुन
त्यात पाणी उतरण्यासाठी टेकडीच्या उतारावर दगडात पन्हाळी कोरलेली आहे. या
टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याच्या वरील बाजुस सीता न्हाणी
नावाने ओळखले जाणारे दुसरे पाण्याचे टाके आहे. या टाक्याकडे जाण्यासाठी
कातळात खाचा मारल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने पुरातत्व खात्याने
लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. या ठिकाणी श्रावण
महिन्यात सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. पर्यटकांची वर्दळ
नसलेले हे सुंदर ठिकाण आवर्जुन भेट देण्यायोग्य आहे.
© Suresh Nimbalkar
सध्या इतकी व्यस्तता झाली आहे की १०-२० किमीची भटकंतीही सुसाह्य झाली
आहे.घर की मुर्गी दाल बराबर सारख ण करता आसपासच्या ठिकाणांना करोनातला
आधार म्हणून डावलून कसे चालेल.टाकळी ढोकेश्वरची लेणी (गुहा) पाहण्याचा
सूटसुटीत बेत आखला .
“श्रावण मासातली हिरवाई पाहत रस्ता कापत होतो.रस्त्याच्या दुतर्फा
देवबाभाळाची आणि पिवळ्या रंगांच्या फुलांनी मांडव घातला होता.शेतातली
पिकं,झेंडूची फुले ,सूर्यफुल मन मोहित करीत होती.एक हिरवाईने नटलेला डोंगर
दिसला येतांना थांबूया इथे ठरवले.हवेत आल्हाददायक गारवा जाणवत होता.मनोमनी
पावसाची इच्छा बाळगत होते.
एक तासांत ढोकेश्वर कमान आली.गावापुढचा रस्ता कच्चा थोडा होता.तलावाचा पूल
ओलांडल्यावर उंचावर असलेल ढोकेश्वर मंदिराची तटबंदी दिसू लागली.”किल्ला
किल्ला “पोरगी ओरडू लागली.(तिला मंदिर आवडत नाही किल्ला पाहायचा अशी शेंडी
लावून घराबाहेर काढल होत)
१.तटबंदी
.नागमोडी पायऱ्या, मधे कमान ही रचना आवडली. तटबंदी पेशवेकालीन बांधली आहे.
२.पायऱ्या
थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या हाताला यादवकालीन शंकराचे मंदिर आहे
.मंदिरावरच्या दगडांवर वेगवेगळे फुले कोरलेली आहेत ,तर एक वेगळेच चिन्ह
कोरलेले दिसले.मंदिरातीलं पिन्डीसमोर एक गोमुख कि नंदी आहे. मंदिराचे छत
रचना त्रीमित्रिक भासते.समोर एक दगडात बांधलेली समाधी आहे.
३.छत
४.वेगळा पक्षी
डाव्या बाजूला शरभ कोरलेली एक शिळा आहे.त्यावर भस्म लावून या मूर्तीची
आणखीन हानी होत आहे हे कोण सांगणार?आणि कोणाला? वाईट वाटलं.शरभ हा आठ
पायांचा अशंत: सिंह आणि अंशतः पक्षी स्वरूपातील काल्पनिक प्राणी आहे.तो
सामर्थ्यवान असून सिंहालाही मारू शकतो.तर बौध्द जातक कथांनुसार शरभ हा
बुद्धाच्या पुर्वाव्तारांपैकी एक आहे.(Wikipedia)
५.शरभ
पुढे पायऱ्या चढून कमान लागली आणि आणखीन पायऱ्या चढून तीच जिला पाहण्यासाठी
डोळे आसुसले होते ती लेणी दिसली .पण माझ दुर्दैव ती बंद होती.तेव्हा
जाळीतूनच आतल्या मूर्तींना न्याहाळाव लागलं आपण अंतर फार नसल्याने
बऱ्यापैकी पाहता आल्या.
पहिल्यांदा बाहेर यमुना आणि नर्मदा या भव्य अशा सुंदरी भासणाऱ्या कोरलेल्या मूर्ती आहेत.
त्यांचा पायाशी सुबक अशा मूर्ती आहेत तर वरील बाजूसही सुंदर असे आकाशातून
त्यांना नमन करणारे देवगण कोरलेले आहेत. मंदिर चार मुख्य खांबांवर तोलले
आहे .खांब अतिशय सुंदर नक्षीकाम आणि जातक कथेतील प्राणी कोरलेले आहेत.तसेच
खांबाखालील दगडांवर मूर्ती कोरल्या आहेत ज्या वाद्य वाजवत आहेत असा भास होत
आहेत.
मंदिरात डाव्या बाजूला सप्तमातृका पट आहे.शेवटी मोदक घेतलेला गणपती आहे.
उजव्या बाजूला शिवतांडव भव्य मूर्ती कोरलेली आहे ,जिच्या दोन्ही बाजूंना
वेटोळे घातलेले फणाधारी नाग आहेत.समोर दोन खांब आणि प्रवेशद्वाराजवळ दोन
आयुधधारी द्वारपाल आहेत.त्यांच्या आजूबाजूस,त्रिशूळपुरुष,कुबेर व इतर
मूर्ती कोरल्या आहेत.
मंदिरात दोन नांदी आहेत.एक समोर तर एक उजवीकडे?दोन कसे हे समजले नाही.
बाहेर आल्यावर उजव्या हाताला वर चढून एक टाकी आहे पण तिथे जाण्यास बंदी
आहे.त्याकडे जाणारी पायऱ्यांची रचना विशेष दगडात खुबे पाडलेली आहे.विचारपूस
केली असत पहाटे चार ते सहा मंदिर खुले अपाहता येईल असे समजले आम्ही
उभयतांना एकमेकांकडे पाहिले हसावे कि रडावे समजेना .
पायऱ्या उतरत उन्ह तरीही चांगलच चढल होत,पावसाळ्यातही पाऊस नव्हता यंदा दुष्काळ जास्त पडला आहे.
त्यामुळे जवळच्या तलावापाशी काही वेळ रेंगाळलो .आम्हा दुष्काळातल्या
लोकांना एव्हढ पाणी म्हणजे काय आंनद !!!संथ पाण्याकडे पाहत नकळत ओळी
गुणगुणल्या
तलाव
कार्जुनेचा बेत रद्द केला कारण पोरीच्या पोटात कावळे ओरडायला लागले
होते,बरोबर आणलेल्या पोळी भाजीला खाण्यास तिने साफ नकार दिला ,तेव्हा बापाच
काळीज हळहळळलं आणि बायको हरली. माघारी फिरलो.जातांना मात्र नेप्तीच्या
भेळीला थांबलो.एक भेळ दोघांना सरता सरत नाही,मटकी,काकडी आणि बरोबरीला
तळलेली मिर्ची हि याची खासियत आहे.
भेळ
ज्यूस पिऊन पोरगी जरा शांत झाल्यावर ,अजून एक लावलेली शेंडी सनफ्लावर दाखवले आणि गाडी खुश झाली.
आता अभ्यासक मिपाकर प्रचेतस यांचा हा ढोकेश्वरवरचा लेख वाचून हि भटकंती सुफळ संपर्ण करा
https://misalpav.com/node/49191
कान्हूरपठार-नगर, पुणे जिल्ह्यांमधे पसरलेला एक ओसाड, रखरखीत, बोडका प्रदेश, फारशा खोल नसलेल्या पण तरीही भरपूर दर्याखोर्यांनी व्यापलेला पठारी भाग. इथल्या विशिष्ट भूरचनेमुळे त्याहीपेक्षा निसर्गाच्या किमयेने इथे भूरूपांच्या चित्रविचित्र संरचना तयार झाल्या आहेत जशी निघोजची रांजणकुंडे, गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू, वडगाव दर्याचे लवणस्तंभ. ह्या नैसर्गिक भूरूपांबरोबरच विविध देवस्थांनांनीसुद्धा हा प्रदेश समृद्ध आहे जसे निमगावचा खंडोबा, कन्हेरसरची देवी, कवठ्याची यमाई. पश्चिम महाराष्ट्रातील बर्याच जणांची कुलदैवते ही याच प्रदेशातील आहेत. ह्या मध्ययुगीन देवस्थांनांबरोबरच इथे प्राचीन म्हणजेच साधारण ६ व्या, ७ व्या शतकात राष्ट्रकूट कालखंडात खोदली गेलेली ब्राह्मणी शैलीची लेणीसुद्धा आहेत. कधीची ही लेणी पाहायची होती शेवटी परवा अगदी अचानक ही लेणी पाहायला जाण्याचे ठरले आणि रविवारी मी, आत्मूबुवा आणि धन्या असे तिघेजण आत्मूबुवांच्या खेचरावर बसून निघालो.
आमच्या भटकंतीचा गूगल नकाशा
मोशीला चहासाठी थांबून पुढचा पडाव घेतला ते नारायणगावला राजकमलच्या सुप्रसिद्ध मिसळीपाशी. मिसळ हाणून आळेफाट्याला उजवी मारून नगर रस्त्याला लागलो. आळे गावापासून थोडेसे आत साधारण ३ किमी वर ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्या रेड्याची समाधी आहे. गंमत म्हणून आम्ही आत वळलो. समाधीमंदिर बर्यापैकी मोठे आहे. स्वागतकमानी, भक्तमंडप अशी जोरदार बांधकामे चालू आहेत. समाधीमंदिरातील गाभार्यात विठ्ठल रखुमाई आणि माऊलींची मूर्ती आहे. आणि खालच्या पातळीत रेड्याचे दगडी मुख कोरलेले आहे. एका दंतकथेचेही लोकांनी आधी दैवतीकरण आणि त्याअनुशंगाने नंतर बाजार मांडलेला पाहून गंमत वाटली. मंदिर पाहून झाल्यावर पुन्हा माघारी येऊन नगर रस्त्याला लागलो.
वाटेत गुळूंचवाडी ओलांडल्यावर अणे घाट लागतो. डावीकडच्या दरीत एक नैसर्गिक आश्चर्य दडलेले आहे ते म्हणजे गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू. मळगंगा नदीच्या प्रवाहामुळे कातळाला मोठे भगदाड पडलेले असून पुलासारखीच रचना तिथे तयार झालेली आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह तिथून अगदी फुफाटत वाहतो. बाजूलाच मळगंगा देवीचे छोटेखानी मंदिर आहे. मी तो नैसर्गिक पूल अगोदरच एकदा खाली उतरून पाहिला असल्याने आणि इतर दोघांना उन्हातान्हात दरीत उतरण्यास फारसा इंट्रेस्ट नसल्याने आम्ही घाटातूनच पुलाचे विहंगम दर्शन घेतले आणि पुढे निघालो. आळेफाट्यापासून आमचे लेण्यांचे ठिकाण, टाकळी ढोकेश्वर साधारण ३८ किमीवर. रस्ता अतिशय उत्तम त्यामुळे लवकरच टाकळी ढोकेश्वर गावात पोहोचलो. हे तसे बर्यापैकी मोठे गाव. गावातूनच ४/५ किमीवर ढोकेश्वराचा डोंगर. गावात कोठेही ढोकेश्वर मंदिर विचारले तर गावकरी रस्ता सांगतात. गावातून बाहेर पडून मंदिर रस्त्याला लागलो. मंदिर म्हणजे डोंगरावरची ढोकेश्वर लेणी. सरत्या पावसाळ्यातही हा डोंगर तसा भकासच वाटत होता. हिरवाई असूनही नसल्यासारखीच आणि जी काही थोडीफार आहे ती देखील पुढच्या महिन्याभरात लयास जाईल.
रस्ता थेट लेण्यांच्या पायथ्यापर्यंत जातो. काही बांधीव तर काही खोदीव अशा पायर्या लेणीपर्यंत जाण्यासाठी आहेत. साधारण दोनशेच्या आसपास पायर्या असाव्यात. लेण्यांभोवती तट बांधला आहे आणि त्यातूनच प्रवेशद्वार केले आहे. तटाचे हे बांधकाम पेशव्यांच्या कालखंडात केव्हातरी झाले आहे. तटाच्या दरवाजात तत्संबंधी एक शिलालेख आहे. दरवाजाच्या आधी उजवे बाजूस एका यादवकालीन मंदिराचा अवशिष्ट भाग असून गाभार्यात काही शिवपिंडी तसेच दगडी पादुका कोरलेल्या आहेत. तर डाव्या बाजूस शरभ शिल्पांकित दगड बेवसाऊ पडला आहे.
१. ढोकेश्वराचा डोंगर
२. लेण्यांभोवतीचा तट
३. प्रवेशद्वाराअलीकडील मंदिर
४. मंदिरद्वाराच्या उंबरठ्यावरील शिल्प
५. प्रवेशद्वाराच्या डावीकडील शरभाचे शिल्प
६. प्रवेशद्वारातील शिलालेख
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अजून काही पायर्या चढून आपला प्रवेश थेट लेणीच्या पुढ्यातच होतो.
ही लेणी राष्ट्रकूटकालीन. साधारण ६ व्या/ ७ व्या शतकात खोदली गेलेली. एक मोठं प्रमुख लेणं, त्याच्या बाजूला जराशा उंचीवर खोदलेले एक अर्धवट लेणं आणि एक खोलवर गेलेलं पाण्याचं टाकं अशी याची रचना. लेण्याच्या पुढ्यातच एक पेशवेकालीन दिपमाळ आहे. ही लेणी पाहून वेरूळच्या रामेश्वर लेणीची आठवण येते. तिथे डावीकडे गंगा आणि उजवीकडे यमुना. इथे मात्र उलट. डावीकडे यमुना व उजवीकडे गंगा. अगदी सहजी ओळखू येतात त्या त्यांच्या वाहनांमुळे. यमुना कासवावर उभी आहे तर गंगा मकरावर. दोन्ही मूर्ती बर्याच भग्न झाल्यात. भग्न झाल्या असे म्हणण्यापेक्षा इथला कातळाचे ठिसूळ असल्याने बरेच विदारण झालेय. त्यामुळे इथल्या मूर्ती काहीशा कुरुप दिसतात पण तरीही त्यांचे मूळचे सौंदर्य काही लपत नाही. दोन्ही नद्यांची वस्त्रे पारदर्शक असून ती त्यांचे प्रवाहीपण सूचित करतात. आधारासाठी आपला एक हात त्यांनी एका बटूच्या खांद्यावर ठेवला आहे. जणू आपला वेगवान प्रवाह त्या काहीसा आवरून घेत आहेत. तर वरती गंधर्व ही नदीची रूपे निरखत आहेत.
७.लेण्याबाहेरची दिपमाळ
८. कूर्माधिष्ठित यमुना
९. मकरारूढ गंगा
१०.गंगेशेजारीच मकराजवळ एका सेविकेची उत्कृष्ट मूर्ती कोरलेली आहे.
११. लेण्याचा दर्शनी भाग
१२. दर्शनी भागातील नक्षीदार स्तंभ
इथे आमचा झोपाळू मित्र प्रवेशद्वारातील ओसरीवरच आडवा झाला आणि लेणी पाहायला मी आणि आत्मुबुवा आत शिरलो.
सभापंडप, डाव्या आणि उजव्या कोपर्यातील उपमंडप अथवा अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी ह्या लेणीची रचना. गर्भगृहाभोवती फेरी मारण्यासाठी कातळकोरीव मार्ग आहे. तसेच गर्भगृहात प्रवेशण्यासाठी उजवीकडूनही एक द्वार आहे. वेरूळच्या लेणी क्र. १४ (रावण की खाई) किंवा पुण्याच्या पाताळेश्वराच्या लेणीसारखी अशी ही रचना.
प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे. वीरभद्र
(नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर), वैष्णवी
(गरूड), वाराही (वराह), ऐन्द्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि शेवटी
मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे.
प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा माडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही
वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.
१३. संपूर्ण सप्तमातृकापट
१४. वीरभद्र
१५. सप्तमातृका अधिक जवळून अनुक्रमे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा
१६. वराहमुखी वाराही
सप्तमातृकांच्या बरोबर समोर म्हणजेच प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे एक उपमंडप आहे. त्यात आहे नटराज शिव अथवा शिवतांडव. दोन स्तंभांमुळे हा उपमंडप सभामंडपातून काहीसा वेगळा झाला आहे. त्रिशूळ, नाग, डमरू आदी आयुधे हाती धरून शिव तांडवनृत्य करत असून पार्वती, शिवगण, देवगंधर्व हे नृत्य पाहात आहेत.
१७. शिवतांडव
१८. शिवतांडव जवळून
१९. शिवतांडव पटाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीत नागप्रतिमा आहेत.-
सप्तमातृका तसेच शिवतांडव अशा दोन्ही पटांच्या बाजूला कक्ष खोदलेले आहेत. मातृकांशेजारच्या कक्षात कुठल्याश्या जुन्या मंदिरातल्या मूर्तींचे बहुत अवशेष आहेत. बहुधा पायथ्याचे हे कुठलेतरी यादवकालीन मंदिर असावे. कक्ष जाळी लावून कुलूपबंद केला असल्याने हे नीट पाहताच आले नाही मात्र जमेल तशी काही छायाचित्रे घेतली.
२०. सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष (विष्णू)
२१. सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष
शिवतांडवपटासशेजारच्या क़क्षात काही वीरगळ आडवे करून ठेवलेले आहेत.
२२. वीरगळ
एव्हाना माझी आणि बुवांची चर्चा ऐकून ढोकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या गावकर्यांचे कोंडाळे झाले होते. त्यांच्या शंकांना आम्ही जमेल तशी उत्तरे देत होतो. स्थानिकांच्या दंतकंथा, मूर्तीं त्यांनी दिलेली चुकीची नावे पाहून थोडी मौजही वाटत होती. इतक्यातच त्यांनी गर्भगृहाच्या दरवाजातील एका मूर्तीकडे निर्देश केला आणि म्हणाले ही शनीची मूर्ती. अर्थात ही मूर्ती शनीची नसून ती होती आयुधपुरुषाची- त्रिशुलपुरुषाची.
कलचुरी, राष्ट्रकूट कालखंडात आयुधपुरुष द्वारपालांच्या भरपूर मूर्ती खोदल्या गेल्या. त्या आपल्याला वेरूळ, घारापुरी, टाकळी ढोकेश्वर अशा ब्राह्मणी लेण्यांत तसेच वेरूळ येथेच बौद्ध लेण्यांतही दिसून येतात. सर्वसाधारणपणे द्वारपाल आणि त्यांच्या शेजारी खालच्या बाजूस एक ठेंगणी व्यक्ती अशी यांची रचना. ह्या ठेंगण्या मूर्ती म्हणजेच द्वारपालांच्या हातातील आयुधे, इति आयुधपुरुष. तर टाकळी ढोकेश्वरच्या गाभार्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूंना अशा आयुधपुरुष मूर्ती आहेत. पैकी उजवीकडील द्वारपालानजीकची आयुधपुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झाली आहे मात्र डावीकडील पूर्णपणे दृग्गोचर आहे. ती आहे त्रिशुळपुरुषाची. आता ही मूर्ती ओळखायला अगदीच सोपी कारण ह्याने हाताची घडी घातली असून मस्तकी त्रिशुळ धारण केला आहे. साहजिकच हा त्रिशुळपुरुषाकडे निर्देश करतो. शिवाय हे शैव लेणे असल्याने द्वारपाल त्रिशुळधारी असणे हे ही अगदी सुसंगतच.
ह्या आयुधपुरुषाच्याच बाजूला एक बैठी मूर्ती आहे तसेच त्याच्या खालच्या बाजूला कुठलासा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे. ह्या मूर्ती खडकाचे विदारण झाल्यामुळे नीटशा ओळखता येत नाही. उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या वरचे बाजूस मात्र धनाची थैली घेऊन चाललेला कुबेर सहजी ओळखू येतो. इतर दिक्पालांचा मात्र येथे अभाव आहे. सभामंडप आणि अंतराळ ह्यांना विभाजीत करणार्या स्तंभचौकटीवर गजान्तलक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत.
२३. गर्भगृहाचा दर्शनी भाग
२४. आयुधपुरूष द्वारपाल
२५. त्रिशुळपुरुष
२६. प्रवेशद्वाराच्या उजवीकडील कुबेर
२७. गाभार्यातील शिवलिंग
गर्भगृहाला फेरी मारण्यासाठी कातळातच खोदून काढलेला मार्ग आहे. वाटेत दोन अतिशय देखणे वीरगळ ठेवलेले आहेत.
२८. वीरगळ
२९. वीरगळ
३०. कातळकोरीव प्रदक्षिणा मार्ग
गर्भगृहाच्या प्रदक्षिणामार्गाच्या उजवे बाजूच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरही एक भव्य नंदीची मूर्ती कोरलेली आहे. एक फेरी मारून आम्ही लेणीच्या बाहेर आलो. आमचे झोपाळू मित्र नुकतचे झोपेतून उठत होते. परत एकदा त्यांना बळेबळे आत बोलावून सप्तमातृकांचे आणि इतरही दर्शन घडवले आणि तिघे लेण्याच्या बाहेर आलो.
लेण्याच्या डावीकडे एक पाण्याचे टाके आहे जे आहही पिण्यायोग्य आहे आणि त्याच्या वरच्या बाजूलाच एक लहानसे लेणे आहे. तेथे जायला उभ्या कातळावर पावठ्या खोदलेल्या आहेत. हे लेणे म्हणाजे एक लहानसा कक्ष असून आत काहिही नाही. इकडे मात्र धन्या आणि बुवा जाऊन आले.
३१. वरील लहानशा लेण्यकडे जाणार्या पावठ्या
थोडा वेळ थांबून आम्ही लेणी उतरायला सुरुवात केली. दुपारचे दोन अडीच वाजत होते. आता कुठे जायचे ह्याचा विचार चालू झाला. ठिकाणही ठरले, जुन्नरची हिनयान तुळजा लेणी. टाकळी ढोकेश्वर पार करून निघालो. काही अंतर पुढे जातात एक फलक सामोरा आला- कोरठण खंडोबा ८ किमी, बोरी १३ किमी. बोरी हे आमचे मूळ गाव. आमचे आजोबा देखील त्या मूळ गावी कधी गेले नाहीत पण कुठेतरी आमची नाळ मात्र त्याच्याशी जोडलेली राहतेच. कोरठण खंडोबा आमचे कुलदैवत. आतापर्यंत फक्त एकदाच तिकडे जाणे झाले होते. आता इतके जवळ आलोच आहोत तर कुलदैवताला भेटून यावे असे ठरले आणि तुळजा लेणीची भेट रद्द केली.
फाट्यावरून आत शिरलो. कोरठणला जाण्यासाठी पिंप़ळगाव रोठा इकडे यावे
लागते. तिथून डावीकडे कोरठण खंडोबा ३ किमी तर उजवीकडे ६ किमी वर वडगाव
दर्या. आधी कोरठण खंडोबाला गेलो. देवस्थान भले प्रचंड झालेय. इथेही
श्रद्धेचा बाजारच. मूळ मंदिर मात्र १५ व्या शतकातले असून शके १४९१ चा
अर्थात इ.स. १४१३ रोजीचा एक शिलालेख गर्भगृहाचा प्रवेशद्वारावर आहे.
खंडोबाची मूर्ती ही तांदळा स्वरूपात म्हणजेच धोंड्याच्या स्वरूपात ( धोंड्यावर नाक डोळे रेखाटलेली अशी) आहे.
३२. कोरठण खंडोबा देवस्थान
३३. सभामंडपातील स्तंभ जे हा मंडप खूप जुना आहे हे सूचित करतात.
३४. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख
३५. खंडोबा
कोरठण खंडोबाचे दर्शन करुन परत पिंपळगाव रोठा येथे आलो. तिथून सरळ ६ किमीवर वडगाव दर्या. इथली दर्याबाई ही आत्मुबुवांची कुलदेवी. वडगाव दर्याला एक नैसर्गिक आश्चर्य आहे ते म्हणजे इथले अधोमुखी आणि उर्ध्वमुखी लवणस्तंभ.
वडगाव दर्या नावाले अगदी साजेसे. एका खोलवर दरीत हे वसले आहे. कातळातील नैसर्गिक गुहेत दर्याबाई आणि वेल्हाबाई ह्या दोन देवींची मंदिरे आहेत. काही पायर्या उतरून दरीत उतरावे लागते. भोवताली उंच कातळ, समोर कातळातलाच नैसर्गिक ओढा, हिरवागार, शांत परिसर, माकडेही भरपूर. वडगाव दर्याचे आश्चर्य ह्या दोन मंदिरांत आहे. ही दोन्ही मंदिरे आतूनच एकमेकांना जोडलेली आहेत. मंदिरे म्हणण्यापेक्षा गुहा सयुक्तिक ठरावे. गुहांमध्येच देवतांची स्थापना केलेली आहे. दोन्ही गुहांत वरच्या छतातून अखंड पाणी टपटपत असते. ह्या शेकडो हजारो वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने तयार होतात ते लवणस्तंभ.
इथल्या ठिसूळ खडकात चुनखडीचे प्रमाण फार. त्यांच्या संपर्कात कातळात झिरपलेले पाणी येते. हे पाणी हवेतील कर्बद्विप्रणील वायु मिसळल्यामुळे आम्लधर्मी बनते. अशा पाण्यात चुनखडी पटकन विरघळते त्यामुळे खडकात पोकळी तयार होते व हळूहळू चुनखडीयुक्त पाणी अर्थात क्षार किंवा लवण छतांवरील छिद्रांतून बाहेर यायला लागते. पाण्याच्या थेंबात क्षारांचे प्रमाण खूप जास्त असल्यास तेथे क्षार धरून ठेवण्याची पाण्याची क्षमता संपते व हे कण हळूहळू छताला चिकटायला लागतात व लोंंबकळल्यासारखे दिसतात त्याला अधोमुखी लवणस्तंभ अथवा स्टॅलाक्टाईट म्हणतात. हेच थेंब खाली जमिनीवर पडून तिथेही क्षारांचे स्तंभ तयार व्हायला लागतात हे खालून वर असे जाणारे असल्यामुळे त्यांना उर्ध्वमुखी लवणस्तंभ अर्थात स्टॅलाग्माईट असे म्हणतात. हे दोन्ही प्रकारचे स्तंभ वडगाव दर्या येथे आहेत. ह्यापूर्वी मी अधोमुखी लवणस्तंभ पाटेश्वर येथील वर्हाडघर लेणीसमूहात पाहिले होते. येथे मात्र दोन्ही प्रकार पाहता आले.
३६. वडगाव दर्या गुहामंदिर
३७. वेल्हाबाई मंदिरातील उर्ध्वमुखी लवणस्तंभ
३८. दर्याबाई मंदिरातील दीड पुरुष उंचीचे अधोमुखी लवणस्तंभ
३९. गुहांतील अधोमुखी लवणस्तंभ
४०. लवणस्तंभ निर्मितीची आजही चालू असलेली प्रक्रिया
४१. लवणस्तंभ निर्मिती
मंदिर आणि लवणस्तंभ पाहून निघालो. धन्या मात्र एव्हाना वैतागला होता. मात्र आता आमच्या वायफळ गप्पा सुरु झाल्या. विविध विषयांवर भरपूर गप्पा झाल्या, कित्येकदा निरर्थक. वाटेत स्पाला फोन करून त्यांचा राजगड ट्रेक कुठवर आला ह्याची विचारणा केली. थोड्याच वेळात अन्या दातारचा फोन आला. मग त्याला रात्री निगडी प्राधिकरण येथे भेटलो व जेवण करून घरी.
एकंदरीत कान्हूरपठारावरचा हा छोटेखानी दौरा अगदी झक्कास आणि नेहमीपेक्षा वेगळाच असा झाला.
(भाग.. १ : टाकळी ढोकेश्वर आणि पळशी)
टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर मंदिर व लेणी, जामगावचा भुईकोट, पळशी येथील विठ्ठल मंदिर आणि पळशीकरांचा वाडा नि पारनेर या शहराबद्दल चार शब्द घेऊन!
तर तिसरा ब्लॉग मात्र पेडगावच्या बहादुरगड तथा धर्मवीरगडाविषयी असेल आणि तो लवकरच आपल्यासमोर येईल.
१.. टाकळी ढोकेश्वर येथील
ढोकेश्वर मंदिर व लेणी
![]() |
| टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध ढोकेश्वर मंदिर |
![]() |
| श्री ढोकेश्वर |
![]() |
| श्री नंदी |
२.. पळशीचे विठ्ठल मंदिर, भुईकोट आणि पळशीकर यांचा वाडा
विठ्ठल मंदिर :
![]() | |
. |
![]() | |
|
भुईकोट :
पळशीकर यांचा वाडा :
| पळशी येथील पळशीकरांचा वाडा ... १ |
![]() | |
|
![]() | |
|
![]() | |
|
(क्रमश..)
अहमदनगर जिल्हा भटकंती..२, भाग..२
'अहमदनगरला आहे इतिहासाचा, खास अन समृद्ध असा वारसा;टाकळी, पळशी, जामगाव नि पारनेर जणू आहे त्याचा आरसा!'
(भाग.. २ : १. जामगाव आणि २. पारनेर)
३.. जामगावचा भुईकोट :
![]() |
| पूर्वाश्रमीचे जामगाव भुईकोटाचे तथा महादजी शिंदे यांच्या वाड्याचे प्रवेशद्वार अर्थात आजचे रयत शिक्षण संस्थेचे अद्यापक महाविद्यालय प्रवेशद्वार |
जामगावचा हा भुईकोट सुमारे शहाऐंशी एकरभर जागेत वसला असून त्याला कोट व परकोट अशी दुहेरी तटबंदी आहे आणि विशेष म्हणजे अजूनही ती बव्हंशी सुस्थितीत आहे. मागे असलेल्या टेकडीपर्यंत दोन्ही बाजूने ही तटबंदी वर चढवून हा कोट अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळेच कोटाचे आतले बाजूस, टेकडीवर, राजपरिवारासाठी असलेला वाडा, जणू बालेकिल्लाच आहे. या कोटास एकोणीस बुरुज नि चार दरवाजे आहेत; पैकी, यातील पूर्वाभिमुख प्रवेशद्वार सोडलं तर उर्वरित तीनही दरवाजे आजमितीला पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
४.. पारनेर :
पारनेरच्या आसपासची आणखी काही ऐतिहासिक तथा धार्मिक स्थळे :
![]() |
| टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे व निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर या दोहोंची सीमाहद्द विभागणाऱ्या कुकडी नदीतील जगप्रसिद्ध रांजणखळगे व दोन्ही तीरावरील मातामंदिरे |
(भाग..२ समाप्त)
प्रकार : शैव लेणी
जिल्हा : अहमदनगर
श्रेणी : सोपी
संपुर्ण भारतात आढळणाऱ्या १२०० लेण्यांपैकी साधारण ८५० लेणी एकटया महाराष्ट्रात आहेत. हे ऐकायला जरी बरे वाटत असले तरी यातील ३०-४० लेणी वगळता इतर लेणी अज्ञातवासात आहेत हे वास्तव आहे. अज्ञातवासात असलेल्या या लेण्यांपैकी एक लेणे म्हणजे टाकळी ढोकेश्वर. अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात टाकळी गावात असलेले हे लेणे नगरहुन ४० कि.मी.अंतरावर तर पारनेर या तालुक्याच्या ठिकाणाहुन २१ कि.मी.अंतरावर आहे. टाकळी गाव ते ढोकेश्वर लेणी हे अंतर साधारण ५ कि.मी.आहे. कल्याण-नगर महामार्गाने टाकळी गाव पार केल्यावर महामार्गाच्या डाव्या बाजुस ढोकेश्वरची लेणी असलेली लहानशी टेकडी दिसते. या टेकडीच्या मध्यातच ढोकेश्वरची शैवलेणी कोरलेली आहेत. लेण्याचा ताबा पुरातत्व खात्याकडे असुन त्यांनी लेणींपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. टेकडीच्या पायथ्यापासुन टेकडीच्या मध्यात असलेले लेण्याचे प्रवेशद्वार व तटबंदी ठळकपणे दिसुन येते. पायऱ्यांच्या सुरुवातीला डाव्या बाजुस एक दगडी रांजण पहायला मिळतो. येथुन साधारण ५०-६० पायऱ्या चढुन गेल्यावर प्रवेशद्वाराआधी उजवीकडे एक समाधी मंदीर व दुसरा समाधी चौथरा पहायला मिळतो. समाधी मंदीरावर काही प्रमाणात कोरीवकाम केलेले असुन दरवाजावर गणेशशिल्प कोरलेले आहे. समाधी मंदीराच्या आतील चौथऱ्यावर शिवलिंग मांडले आहे. बाहेरील दुसऱ्या समाधी चौथऱ्याला लागुनच एक एक शरभशिल्प ठेवलेले आहे. हे शिल्प बहुधा लेणीच्या तटबंदीतील असावे. लेणींच्या पायऱ्या चढताना काही ठिकाणी नक्षीकाम केलेले बांधकामातील दगड पायऱ्यांसाठी वापरलेले दिसुन येतात. तटबंदीमधील दरवाजाने लेण्याच्या आवारात प्रवेश केल्यावर चौथऱ्यावर उभारलेली दगडी दीपमाळ दिसुन येते. ढोकेश्वरचं लेणं बऱ्यापैकी मोठे असुन लेण्याच्या दोन्ही बाजूस शालभंजिका कोरलेल्या आहेत. लेण्याचा आतील सभामंडप चार स्तंभावर तोललेला असुन डाव्या बाजुस सप्तमातृकापट त्यांच्या वाहनांसह कोरलेला आहे. या पटाच्या एका टोकावर गणपती तर दुसऱ्या टोकाला वीरभद्र कोरलेला आहे. लेण्यातील एका भिंतीवर झीज झालेले गजलक्ष्मी शिल्प आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर दोन्ही बाजूस हातात फुले घेतलेल्या द्वारपाल असुन त्यांच्या डोक्यामागे प्रभामंडळ व त्यांच्यावर विद्याधर कोरले आहेत. गर्भगृहाला फेरी मारण्यासाठी प्रदक्षिणापथ कोरलेला असुन गर्भगृहात शिवलिंग व सभामंडपात नंदीची स्थापना केलेली आहे. या प्रदक्षिणापथावर मोठया प्रमाणात वीरगळ दिसुन येतात. लेण्याबाहेर डाव्या बाजुला कातळाच्या पोटात कोरलेले पाण्याचे टाके असुन त्यात पाणी उतरण्यासाठी टेकडीच्या उतारावर दगडात पन्हाळी कोरलेली आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याच्या वरील बाजुस सीता न्हाणी नावाने ओळखले जाणारे दुसरे पाण्याचे टाके आहे. या टाक्याकडे जाण्यासाठी कातळात खाचा मारल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने पुरातत्व खात्याने लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. पर्यटकांची वर्दळ नसलेले हे सुंदर ठिकाण आवर्जुन भेट देण्यायोग्य आहे.
© Suresh Nimbalkar
एक तासांत ढोकेश्वर कमान आली.गावापुढचा रस्ता कच्चा थोडा होता.तलावाचा पूल ओलांडल्यावर उंचावर असलेल ढोकेश्वर मंदिराची तटबंदी दिसू लागली.”किल्ला किल्ला “पोरगी ओरडू लागली.(तिला मंदिर आवडत नाही किल्ला पाहायचा अशी शेंडी लावून घराबाहेर काढल होत)
१.तटबंदी.नागमोडी पायऱ्या, मधे कमान ही रचना आवडली. तटबंदी पेशवेकालीन बांधली आहे.
२.पायऱ्या
थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या हाताला यादवकालीन शंकराचे मंदिर आहे .मंदिरावरच्या दगडांवर वेगवेगळे फुले कोरलेली आहेत ,तर एक वेगळेच चिन्ह कोरलेले दिसले.मंदिरातीलं पिन्डीसमोर एक गोमुख कि नंदी आहे. मंदिराचे छत रचना त्रीमित्रिक भासते.समोर एक दगडात बांधलेली समाधी आहे.
३.छत
४.वेगळा पक्षी
डाव्या बाजूला शरभ कोरलेली एक शिळा आहे.त्यावर भस्म लावून या मूर्तीची आणखीन हानी होत आहे हे कोण सांगणार?आणि कोणाला? वाईट वाटलं.शरभ हा आठ पायांचा अशंत: सिंह आणि अंशतः पक्षी स्वरूपातील काल्पनिक प्राणी आहे.तो सामर्थ्यवान असून सिंहालाही मारू शकतो.तर बौध्द जातक कथांनुसार शरभ हा बुद्धाच्या पुर्वाव्तारांपैकी एक आहे.(Wikipedia)
५.शरभ
पुढे पायऱ्या चढून कमान लागली आणि आणखीन पायऱ्या चढून तीच जिला पाहण्यासाठी डोळे आसुसले होते ती लेणी दिसली .पण माझ दुर्दैव ती बंद होती.तेव्हा जाळीतूनच आतल्या मूर्तींना न्याहाळाव लागलं आपण अंतर फार नसल्याने बऱ्यापैकी पाहता आल्या.
पहिल्यांदा बाहेर यमुना आणि नर्मदा या भव्य अशा सुंदरी भासणाऱ्या कोरलेल्या मूर्ती आहेत.
त्यांचा पायाशी सुबक अशा मूर्ती आहेत तर वरील बाजूसही सुंदर असे आकाशातून त्यांना नमन करणारे देवगण कोरलेले आहेत. मंदिर चार मुख्य खांबांवर तोलले आहे .खांब अतिशय सुंदर नक्षीकाम आणि जातक कथेतील प्राणी कोरलेले आहेत.तसेच खांबाखालील दगडांवर मूर्ती कोरल्या आहेत ज्या वाद्य वाजवत आहेत असा भास होत आहेत.
मंदिरात डाव्या बाजूला सप्तमातृका पट आहे.शेवटी मोदक घेतलेला गणपती आहे.
उजव्या बाजूला शिवतांडव भव्य मूर्ती कोरलेली आहे ,जिच्या दोन्ही बाजूंना वेटोळे घातलेले फणाधारी नाग आहेत.समोर दोन खांब आणि प्रवेशद्वाराजवळ दोन आयुधधारी द्वारपाल आहेत.त्यांच्या आजूबाजूस,त्रिशूळपुरुष,कुबेर व इतर मूर्ती कोरल्या आहेत.
मंदिरात दोन नांदी आहेत.एक समोर तर एक उजवीकडे?दोन कसे हे समजले नाही.
बाहेर आल्यावर उजव्या हाताला वर चढून एक टाकी आहे पण तिथे जाण्यास बंदी आहे.त्याकडे जाणारी पायऱ्यांची रचना विशेष दगडात खुबे पाडलेली आहे.विचारपूस केली असत पहाटे चार ते सहा मंदिर खुले अपाहता येईल असे समजले आम्ही उभयतांना एकमेकांकडे पाहिले हसावे कि रडावे समजेना .
पायऱ्या उतरत उन्ह तरीही चांगलच चढल होत,पावसाळ्यातही पाऊस नव्हता यंदा दुष्काळ जास्त पडला आहे.
टाकळी ढोकेश्वरची लेणी
जिल्हा: अहमदनगर
कल्याण-नगर रस्त्यावर नगरच्या अलीकडे ४० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर
गाव आहे. टाकळी ढोकेश्वर गावापासून ४ किलोमीटर अंतरावर डोंगरात
ढोकेश्वराची पांडव लेणी आहेत. महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव
पार करून पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते.
लेणींपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी चढून जाताना एक
कमान लागते. कमानीवर मोडी शिलालेख आहे. लेणींपासून पाऊण उंचीवर मध्य युगात
बांधलेलं प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरूनच आपलं लक्ष वेधून
घेते. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला दिसतो. येथूनच
पुरावशेष आपलं लक्ष वेधून घेऊ लागतात. पायऱ्या चढताना प्रवेशद्वाराच्या
अलीकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरं आहेत. त्यावर दगडी फुलं कोरलेली
आहेत. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेलं आहे. हा दरवाजा आणि त्याच्या
बाजूची तटबंदी जेव्हा बांधली असेल तेव्हा प्रवेशद्वारावर शरभ शिल्प असणार,
पण कालांतराने डागडुजी करताना ते मूळ जागेवरून काढून टाकलं असावं.
लेणींच्या पायऱ्या चढताना नक्षीकाम केलेले दगड पायऱ्यांसाठी वापरलेले
आढळतात.
टाकळी ढोकेश्वरचं मुख्य लेणं प्रशस्त आहे. चार खांब
असलेल्या या गुहेत महादेव मंदिराभोवती कोरण्यात आलेली ब्राम्हणी लेणी
राष्ट्रकूटकालीन इ. स. ५५० ते ६०० य काळातील आहे. लेणीत शिरताना दोन्ही
बाजूला शालभंजिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला
आहे. लेण्यातील भिंतीवर गजलक्ष्मीचे शिल्प आहे. सभामंडपातील डाव्या
बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह
कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला
वीरभद्राची मूर्ती कोरलेली आहे. भिंतीवर हातात फुले घेतलेल्या दोन
द्वारपालांची शिल्पे असून, त्यांच्या डोक्यामागील प्रभामंडळ आणि त्यांच्या
वर असलेले विद्याधर केवळ पाहण्याजोगे आहेत. सभामंडपात नंदी आहे.
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूंना आयुधपुरुष मूर्ती आहेत. पैकी
उजवीकडील द्वारपालानजीकची आयुधपुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झाली आहे मात्र
डावीकडील पूर्णपणे दृग्गोचर आहे. ती आहे त्रिशुळपुरुषाची. आता ही मूर्ती
ओळखायला अगदीच सोपी कारण ह्याने हाताची घडी घातली असून मस्तकी त्रिशुळ धारण
केला आहे. साहजिकच हा त्रिशुळपुरुषाकडे निर्देश करतो. शिवाय हे शैव लेणे
असल्याने द्वारपाल त्रिशुळधारी असणे हे ही अगदी सुसंगतच. ह्या
आयुधपुरुषाच्याच बाजूला एक बैठी मूर्ती आहे तसेच त्याच्या खालच्या बाजूला
कुठलासा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे. ह्या मूर्ती खडकाचे विदारण
झाल्यामुळे नीटशा ओळखता येत नाही. उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या वरचे
बाजूस मात्र धनाची थैली घेऊन चाललेला कुबेर सहजी ओळखू येतो. इतर
दिक्पालांचा मात्र येथे अभाव आहे. सभामंडप आणि अंतराळ ह्यांना विभाजीत
करणाऱ्या स्तंभचौकटीवर गजान्तलक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत.
गर्भगृहामध्ये शिवलिंगावर मानवी चेहरा असलेला तांब्याचा मुखवटा आहे.
गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ कोरून काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर अनेक
वीरगळ ठेवलेल्या आहेत. एक मोठा नंदीही आणि सर्पशिळा येथे ठेवलेल्या आहेत.
मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाकेदेखील कोरलेले आहे. त्यात पाणी
येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरून काढलेली आहे. या
टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या
नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या आहेत.
ह्या लेण्या पाहताना तिथं सप्त मातृका आणि त्या बरोबर उजव्या हातास गणपती
पाहायला मिळतो. मुळात सप्त मातृका म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे म्हणजे
हे शिल्प सौंदर्य पाहताना आजून आनंद पल्लवित होतो. हिंदू धर्माच्या
ऋग्वेद, मार्कन्डेय पुराण, चंडी महात्म्य, आणी शाक्त संप्रदायात ह्या सप्त
मातृकांचा उल्लेख येतो.
चला तर पाहुयात ह्या सप्त मातृका
देवींची नावे आणि त्यांची माहिती. सप्त मातृका पुढील प्रमाणे आहेत.
1.ब्रम्हानी, 2.वैष्णवी, 3.माहेश्वरी, 4.इंद्राणी, 5.कौमारी, 6.वाराही,
7.चामुंडा. काही विद्वानांच्या मते ह्या शैव देवी आहेत. महाभारतात आणी
पुराणांत ह्यांची संख्या ही सात, अठरा, आणि बत्तीस अशी दिलेली आहे. नेपाळ
मध्ये अष्ट मातृकांची पूजा होते आणि पश्चिम भारतात सप्त मातृकांची पूजा
होते. वराह मिहिरच्या बृहत्संहितेत आणी शुद्रकच्या मृच्छकटिक मध्ये ह्या
सप्त मातृकापूजनाचा स्पष्ट उल्लेख आहे. चालुक्य आणी कदंब राजवंश हे ह्या
सप्त मातृकांचे उपासक होते.
आता ह्या सप्त मातृका आपण त्यांच्या नावासहित समजावून घेऊ.
चामुंडा- देवी चामुंडाच्या शक्तींचे प्रतिनिधित्व करणारी. हिलाच चामुंडा
किंवा चर्चिका असेही म्हणतात. ह्या देवीचा रंग हा महाकालीशी साधर्म्य
दाखविणारा आहे.
नर मुंडांची माळा गळ्यात घालणारी आणि कृष्ण वर्ण
असणारी ही देवी आपल्या चार भुजांमध्ये (भुजा- हातात) डमरू, तलवार, त्रिशूळ
आणि पाणपत्र धारण करणारी आहे. मृत्यू झालेल्या शवांच्या सानिध्यात ही देवी
अत्यंत भीतिदायक दिसते. हिचे वाहन कोल्हा आहे.
इंद्राणी- ही देव इंद्राच्या शक्ती प्रदर्शित करणारी. हिलाच एन्द्री, महेंद्री, किंवा वज्रेश्वरी असेही म्हणतात. हिला चार भुजा आणि एक हजार नेत्र असून इंद्रासारखीच ही वज्र धारण करणारी आहे. ह्या देवीचे वाहन एरावत (हत्ती) आहे.
वाराही- भगवान विष्णूचा अवतार वराह, आणि यमदेवाच्या शक्ती प्रदर्शित करणारी. ही देवी आपल्या चार हातांत दंड, नांगर, तलवार, आणी पाणपत्र धारण करणारी आहे. हिलाच अर्ध नारी आणी अर्ध वराहच्या रूपातही दाखविले जाते. ह्या देवीचे वाहन म्हैस आहे. पण शिल्पात हिचे वाहन वराहच दाखविलेले आहे.
वैष्णवी- भगवान विष्णूच्या शक्ती प्रदर्शित करणारी. हिला चार भुजा असून विष्णू सारख्याच ह्या देवीच्या हातात शंख, चजर, गदा आणि कमळ आहे. ह8 देवी ऐश्वर्य प्रदर्शित करणारी आहे. ह्या देवीचे वाहन गरुड आहे.
ब्रम्हानी- ब्रम्हदेवाच्या शक्ती प्रदर्शित करणारी. ही पित वर्णाची (पिवळ्या रंगाची) असून हिला चार भुजा (हात) आहेत. ब्रम्हदेवा सारखेच हिचे आसन कमळाचे आहे. ह्या देवीचे वाहन हंस आहे.
माहेश्वरी- महादेवाच्या शक्ती प्रदर्शित करणारी. हिला चार भुजा असून हिलाच दुसरं नाव रुद्राणी असंही आहे; जी महारुद्राच्या शक्ती प्रदर्शित करते. हिच्या हातात त्रिशूळ, डमरू, आणि रुद्राक्षमाला आहे. महादेवासारखीच ही त्रिनेत्रधारी आणि त्रिशूळ धारण करणारी आहे. ह्या देवीचे वाहन ऋषभ आहे.
कौमारी-
शिवपुत्र कार्तिकेयाच्या शक्ती प्रदर्शित करणारी. हिलाच कुमारी, कार्तिकी
आणी अंबिका अशीही नावे आहेत. ही देवी आपल्या चार हातांत परशु, भाला, धनुष्य
आणी मुद्रा धारण करणारी आहे.ह्या देवीचे वाहन मोर आहे. पण शिल्पात हिची
कुमारीची मूर्ती दाखविलेली आहे.
तर अश्या ह्या सप्त मातृका.
सगळ्यात महत्वाचे: शेवटची मूर्ती म्हणजे एकदम डावीकडील मूर्ती ही शंकराची असून त्याचे वाहन नंदी हे मूर्ती खाली दर्शविलेले आहे. लोक चुकीने ह्या आठव्या मूर्तीलाही देवी समजतात आणि परत परत मोजत आता ही आठवी मूर्ती कुठल्या देवीची? असा विचार करत बसतात.
एका दिवसात विशेष ऐतिहासिक वास्तू पाहायची असल्यास हे एक उत्तम ठिकाण आहे.

































































No comments:
Post a Comment