भारतातील एक हजार लेण्यापैकी जवळपास आठशे लेणी महाराष्ट्रात आहे, त्यातील सर्वाधिक लेणी जुन्नर परिसरात आहेत. शिवनेरी लेणी, तुळजा, लेण्याद्री, अंबा-अंबिका, भुतलिंग आणि नाणेघाट या लेण्यांना बरेच जण भेट देतात.याच जुन्नर परिसरात असलेल्या मात्र कल्याण -अहमदनगर मार्गावरील मुरबाड जवळील गणेश लेणी उर्फ गणपती गडद फार कमी जणांना माहिती आहे.आज आपण या लेण्यांची माहिती घेणार आहोत.
गडद म्हणजे कातळातली गुहा किंवा गुफा. गणरायाच्या नावानेच 'गणपती गडद' हे ठाणे दुर्गम जागी भटकंती करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. प्राचीन काळी कल्याण - मुरबाड - वैशाखरे - नाणेघाट असा व्यापारी मार्ग होता. छोट्या गलबतातून कल्याण बंदरात उतरणारा माल या व्यापारी मार्गाने घाटावरील बाजारपेठात जात असे. या व्यापारी मार्गावर माळशेजच्या डोंगररांगेत पळु सोनावळे गावाजवळील डोंगरात हिंदु लेणी कोरलेली आहेत.या लेण्यांच्या संकुलात १२ लेणी आहेत. यातील मुख्य लेणे दुमजली असुन त्याच्या व्दारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. यावरुन या लेण्यांना गणपती गडद अस नाव पडल आहे.नि:संशय ह्या ब्राम्हणी लेण्या आहेत आणि साधारणतः सातव्या शतकात खोदल्या गेल्या असाव्यात.लेण्यांमध्ये काही विशेष शिल्पकारीता नसली तरी एका लेण्यातील (जे एकमेव दुमजली लेणे आहे) महीषासुरमर्दिनीच्या मूर्तीशिवाय इतर कुठल्याही विशेष मूर्ती नाहीत. ईथे अजुन कालभैरव, गजलक्ष्मी, मातृका यांच्या पण मूर्ती होत्या. ह्या एकूण ११ लेण्या आहेत आणि पायथ्याला सोनावळे गावातून कनकवीरा नदी वाहते. अत्यंत प्राचीन आणि पुर्वापार वाहत्या असलेल्या नाणेघाट, दार्या (आंबोली घाट), अहूपे घाट ह्या व्यापारी मार्गांशी भौगोलीक जवळीक बघता पुर्वी ह्या लेण्यांचे बरेच महत्व असू शकते.. सातव्या शतकात खोदलेल्या गडद इथल्या भव्य लेण्यांद्वारे तात्कालिन संस्कृतीची ओळख होण्यासाठी मोठी मदत होते. इ.स. १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या गडदच्या लेण्यांची नोंद घेतली.
नाणेघाट
निसर्गात डोंगरदऱ्यात फिरणाऱ्यांसाठी ही लेणी म्हणजे भटकंतीचं उत्कृष्ट ठिकाणच म्हटलं पाहिजे. गणपती गडद लेणीला भेट देण्यासाठी दोन ऋतू उत्कृष्ट आहेत. पहिला म्हणजे पावसाळा. या ऋतूत या लेणीसमोर स्वर्गच अवतरतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्धवर्तुळाकार असलेल्या या लेणीसमुहासमोरूनच मोठा धबधबा कोसळत असतो. दुसरा काळ म्हणजे उन्हाळ्यातल्या चांदण्या रात्रीचा. नाईट ट्रेकिंगला येथे मुक्काम करण्यासारखा आनंद नाही. ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेला आणि पुणे जिल्ह्याच्या खेटून असणाऱ्या दुर्ग धाकोबाच्या कुशीत गणपती-गडदची लेणी बसली आहे. माळशेज घाटाच्या ठाणे जिल्ह्याच्या बाजूने एक फाट मुरबाड तालुक्यातल्या पळू-सोनावळे या गावात जातो. या गावातूनच वाटाड्या घेऊन या लेणीकडे कूच करायचे.गणपती गडदचा प्रवास म्हणजे कल्याण-मुरबाड-धसई आणि मग गणपती गडदच गाव म्हणजे सोनावळे. वाटेत मुरबाड आणि धसईच्यामध्ये गोरखगडचे अप्रतिम दृश्य नजरेस पडते.
गोरखगड
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, तिथून मुरबाड तालुका आणि या तालुक्यातील सोनावळे या सुंदर गावी जावे लागेल. कल्याण ते मुरबाड हे अंतर साधारण २७ किलोमीटर आहे. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम. नसेल, तरी हरकत नाही. कल्याण ते मुरबाड अशी एसटी सेवा उत्तम आहे. तिथून खासगी वाहनांनी सोनावळे गाठता येते. माळशेज घाटमार्गेही या ठिकाणी जाता येते. त्यासाठी सरळगाव, उमरोली, धसई आणि सोनावळे असा प्रवास करावा लागतो. यासह मुरबाडहून म्हसा जंक्शन आणि तिथून धसई हा मार्गही आहे.
जाण्यासाठी :- १) कल्याण - माळशेज मार्गावर (४७ किमी) उमरोली गावाच्या पुढे फाटा आहे. या फाट्यावरुन उजव्या बाजुचा रस्ता धसई मार्गे (१० किमी) सोनावळे गावात जातो.
२) कल्याण - माळशेज मार्गावर (५० किमी) टोकावडे गावाच्या पुढे फाटा आहे. या फाट्यावरुन उजव्या बाजुचा रस्ता वडगाव मार्गे (१० किमी) सोनावळे गावात जातो.
सोनावळे गावामागील डोंगरात गणपती गडद लेणी आहेत. गावातुन लेण्यांपर्यंत पोचायला दिड ते दोन तास लागतात. शेवटच्या टप्प्यात अर्ध्या तासाचा खडा चढ चढावा लागतो. येथील टाक्यात पावसाळ्या नंतर पाणी नसते.
कल्याण ते मुरबाड (२७ किमी) कल्याण एसटी स्थानकातून मुरबाडला जाणार्या बर्याच गाड्या मिळतात (माळशेज मार्गे जाणार्या गाड्या मुरबाड स्थानकावर थांबतात) त्याच एसटीला पुढे सरळगाव/उमरोली/धसई थांबा असेल तर रुट नंबर १ (खाली दिलेला) ने जायचं असल्यास तिथपर्यंत जावं
मार्ग १: माळशेज रुट
माळशेज रुटवर मुरबाड पासून सरळगावच्या पुढे उमरोली गाव लागतं (मुरबाड - उमरोली अंतर १५ किमी आहे) तिथपर्यंत गेल्यावर उजव वळण घेतल्यावर धसई नावाचं गाव लागतं.धसई हे बाजाराचं गाव असल्याने कोणाला ट्रेकसाठी काही खरेदी करायची असल्यास इथे करता येऊ शकेल. तिथून जवळच सोनावळे गावं आहे. हेच पायथ्याचं गाव आहे. (उमरोली - सोनावळे अंतर अंदाजे ६ किमी) हा रस्ता सुस्थितीतील असून ह्या मार्गावर चहा टपर्या, छोटी हॉटेल्स असल्याने पोटपुजेची सोय इथुन गेल्यास करता येऊ शकेल.
मार्ग २: मुरबाड पासून उजव्या वळणावर म्हसा जंक्शन पर्यंत जाऊन म्हसा पासून डावीकडे वळल्यास धसई गाव लागतं (मुरबाड-म्हसा अंतर १२ किमी; म्हसा जंक्शन - धसई अंतर १८ किमी) ह्या मार्गावर टपर्या, हॉटेल्स तुरळक (न के बराबर) आहेत. ह्या रुटवरुन जाताना बाकीच्या काही गडांची पायथ्याची गावं लागतात (ज्यांना एकाच ट्रेकमध्ये जास्त ठिकाणे करायची आहेत त्यांना ह्या माहितीचा उपयोग होऊ शकेल)
खालील गड आणि पायथ्याची गावं ह्या रुट वरुन जाताना लागतात
गोरख मच्छींद्रचा पायथा - देहरी गाव
सिद्धगडचा पायथा उचले गाव
अहुपे घाटाचा पायथा खोपिवली
पायथ्याच्या पळु गावाबद्दल एक दंतकथा आहे. या गावात मोरे आडनावाची माणस मोठ्या प्रमाणात राहातात. हे सर्व जावळीच्या चंद्रराव मोर्यांचे वंशज आहेत. शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करुन चंद्रराव मोरेचा पराभव केला. त्यावेळी तिथुन पळुन आलेले मोर्यांचे लोक त्याकाळच्या मुघल साम्राज्यातील सोनावळे गावात स्थायिक झाले. त्यामुळे या गावाला पळु सोनावळे (पळुन आलेल्या मोर्यांमुळे "पळु") असे नाव पडले.
सोनावळे गावातून बाहेर पडल्यावर दिसणारे लेण्यांचे प्रथम दर्शन
या ठिकाणाला पहिल्यांदाच भेट देणार असाल, तर गावातून वाटाड्या सोबत घ्यावा. कातळ पहाडातले हे ठिकाण दूरवरून पाहताना कातळात कोरलेले झरोके दुरून खिडक्यांसारखे दिसतात आणि आपली उत्सुकता आणखी ताणली जाते. सोनावळ्यातून निसर्गाच्या कुशीतून गणपती गडद गाठताना आपण त्या वातावरणात रमून जातो. हा छोटा ट्रेक जेव्हा आपण गडदेत पोहोचतो, तेव्हा येथे आल्याचे सार्थक घडवतो. पळु या गावातूनच वाटाड्या घेऊन या लेणीकडे कूच करायचे. साधारण दोन तासात आपण खडी चढाई करून या लेणींमध्ये प्रवेश करतो.
गडदीतुन समोर निसर्गाचा बराच मोठा पट स्पष्ट दिसतो. समोर तीन तलाव व उजव्या बाजूला नाणेघाट.
आडव्या कोरलेल्या या समूहात एकूण सात लेणी आहेत. गणेश लेणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दगडी गुहेत विविध दालणे असून त्यामध्ये विविध हिंदू देवी देवतांची शिल्पे कोरण्यात आली आहेत.यातील मुख्य लेणी ही दुमजली असून तीवर जाण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत.
गडदीतला गणपती
या लेणीच्या प्रवेशद्वारपट्टीवर गणेशाची प्रतिमा कोरलेली दिसून येते. या गणेशपट्टीमुळेच या लेणीला गणपती-गडद असे नाव पडले असावे. या लेणीचा सभामंडप हा बराच मोठा असून, हा पाहताना अष्टविनायकमधील लेण्याद्रीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मध्यभागी मुख्य सभागृह आहे आणि शेजारीच छोटीशी तीन- चार दालने असे या गडदच्या लेण्यांचे स्वरूप आहे.मुख्य लेण्याचा सभामंडप २१ मीटर x १० मीटर असुन तो दोन कोरीव खांबांवर उभा आहे.
दुमजली लेण्यातील दुसरा मजला
लेण्यातून दिसणारे सोनावळे गाव
शेवटच्या लेण्यातून दिसणार्या लेण्या
गुहेच्या वरचा कडा
खांबांवर छताचा भार तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. याशिवाय किर्तीमुख, सुरसुंदरी आणि काही अस्पष्ट मुर्ती आणि नक्षी खांबावर कोरलेली आहे. गाभार्याच्या दोन बाजुला १० मीटर x ७ मीटर दोन खोल्या (कक्ष) असुन त्या रिकाम्या आहेत. गाभार्यात हल्लीच्या काळात बसवलेल्या मुर्ती आहेत. गाभार्याच्या मागील भिंतीत एक खिडकी कोरलेली असुन आत एक दालन कोरलेले आहे, त्याच प्रयोजन मात्र कळत नाही.
या सभामंडपात देखील दोन नक्षीकामाने भरलेले गोलाकार खांब दिसतात. यावरची कलाकुसरही तत्कालीन स्थापत्यशास्त्र चुणूक दाखविल्याशिवाय राहत नाही.
या सभामंडपात देखील दोन नक्षीकामाने भरलेले गोलाकार खांब दिसतात. यावरची कलाकुसरही तत्कालीन स्थापत्यशास्त्र चुणूक दाखविल्याशिवाय राहत नाही.

दुमजली लेण्यातील महीषासुरमर्दिनी
या कातळगुहेत बाप्पाच्या दोन प्राचीनमूर्ती आणि आता नव्याने ठेवलेल्या अनेक मूर्ती पाहायला मिळतात.बाप्पाचे दर्शन घेऊन येथे विसावताना तुमचे मन या कातळलेण्यात हरवून जाते. गडदेतला बाप्पा पाहताना, सभोवतीच्या निसर्गातच जणू बाप्पाचे मनोहारी रूप दडल्याची जाणीव होते आणि या पर्यावरणात असणाऱ्या दैवताला जपण्याची जाणीवही दृढ होते.
लेण्यांच्या परीसरात पाण्याची ३ टाकी आहेत. त्यातील एका टाक्याच्या वरच्या बाजुस कातळात खाचा बनवलेल्या आहेत. टाक्यातील पाण्याचे बाष्पीभवन होउ नये म्हणुन या खाचांमधे लाकडी पट्ट्या आडव्या टाकुन त्यावर आच्छादन केले जात असे.

पावसाळ्यात मुख्य गुहे समोरुन एक धबधबा पडतो. त्यात १८० फुटाचे रॅपलींग केले जाते. धबधब्यांमुळे पाण्याची एक चादरच गडदेसमोर पाहायला मिळते. ढाकोबा, दुर्ग या रांगेतले हे ठिकाण कुणालाही भेट देता येण्यासारखे आहे.
सुकलेले पाण्याचे टाके
या लेणीच्या दोन्ही बाजूला देखील अनेक लेण्या अर्धवट अवस्थेत खोदलेल्या दिसून येतात. तसेच पाण्याच्या टाक्याही दिसतात.
मात्र पावसाळ्यानंतर इथे
पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत होती.
आता ती चिंता मिटली आहे. लेण्याजवळच असलेल्या ‘आंब्याचे पाणी’ या
बारमाही झऱ्यावरून थेट वाहिन्यांद्वारे पाणी लेण्यात आणले आहे.
ग्रामस्थांनी गेल्या पंधरा दिवसात प्रयत्नांची शर्थ करून जवळपास एक
किलोमीटर लांबीची वाहिनी टाकून झऱ्याचे पाणी लेण्यांजवळील टाकीत आणले आहे.
गुरुत्वीय बलाने हे पाणी लेण्यात आले आहे.
गणपती गडद या ठिकाणच्या भेटीसह तुम्ही गोरख-मच्छींद्रगड (देहरी गाव), सिद्धगड (उचले गाव) किंवा अहुपे घाटपायथा (खोपिवली गाव) यांपैकी कोणत्याही जोडट्रेकचे नियोजन करू शकता. संदर्भ :-
१) https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/ganpati-dark/articleshow/70936982.cms
२) https://www.maayboli.com
३) श्री. अमित सामंत यांचे लिखाण









No comments:
Post a Comment