Saturday, February 24, 2024

श्री रेवणसिद्ध तीर्थक्षेत्र

 

१२ महिने २४ तास श्रावण पाळणारं गाव, मंदिरातून दिसते शिखर शिंगणापूरची झलक!

Pooja Karande-Kadam

Shravan 2023 : आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याचं काही ना काही खास वैशिष्ट्य आहे. राजस्थानाला ऐतिहासीक तर केरळला देवभूमी म्हटलं जातं. तसंच आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटलं तर वावग ठरणार नाही. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांचे विचार जूने झाले म्हणजे ते मागे पडले असे नाही. तर त्याच संत महाराजांनी रूजवलेले विचार आजही श्रद्धेने पाळले जातात.

जिथ लोक श्रावण कधी संपतोय अन् आपण कधी मटणावर तुटून पडतोय असा विचार करत आहेत. तर अशात नेहमीच श्रावण पाळणारे एक गाव आहे. ज्या गावातील लोक मासांहार करणे तर सोडाच पण त्याचा विचारही करत नाहीत. हे काही विशिष्ट महिना किंवा वर्षभराच्या रितीप्रमाणे नाही. तर जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत या गावातील लोक मासांहार करत नाहीत.

हे गाव आहे सांगली जिल्ह्यातील विटा तालूक्यातील रेणावी. या गावातील लोक मांसाहारापासून दूर असतात. ते केवळ या गावची प्रथा आहे म्हणूनच. या गावात नवनाथांपैकी एक असलेले श्री रेवणसिद्ध महाराजांचे भव्य मंदिर आहे. (Sangli)

देवस्थान प्रशस्त असून बांधकाम पूर्णपणे दगडांमध्ये करण्यात आलेलं आहे. डोंगरदऱ्या आणि दाट वनराईने हा परिसर वेढलेला आहे. इथे कधी-कधी कोल्हा, काळवीट, हरीण अशा वन्यप्राण्यांचेही दर्शन होते.  

सह्याद्री पर्वतावर असलेल्या डोंगररांगांची सुरूवात खानापूर तालुक्यापासून होते. त्यापैकी ‘रेवागिरी’ नावाची डोंगररांग विटा शहरापासून पूर्वेस सुरू होते. विटा शहराच्या पूर्वेस नऊ किलोमीटर अंतरावर कऱ्हाड-विजापूर रस्त्यावर दक्षिणेस रेणावी गाव आहे आणि इथेच श्री रेवणसिद्ध हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

या वेगळ्या प्रथेबद्दल ग्रामस्थ सांगतात की, श्री रेवणसिद्ध हे मूळ पंचाचार्य पीठ आहे. रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक आहेत. नवनाथ हे पूर्ण शाकाहारी होते. ग्रामदैवत नाथ महाराज असल्याने गावातल्या लोकांना कधीही काही कमी पडत नाही. देवांची अखंड शक्ती सकारात्मक उर्जा गावात नेहमी जाणवते. गावात कधीही भांडण-तंटे होत नाहीत. देवांसाठी आम्हीही हे संपुर्ण शाकाहाराचे व्रत केले आहे, असेही ग्रामस्थ सांगतात.  (Shravan)

एखाद्याचे लग्न ठरवतानाही त्याबाबत लग्नाची बोलणी केली जाते. शाकाहारी असलेल्या कन्येची निवड केली जाते. किंवा तशी कल्पना नववधूला देऊन मगच लग्नाची सुपारी फुटते. गावात सर्व धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाने ही परंपरा जपली आहे. तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांना याचं नवल वाटत नाही. ते श्रद्धा म्हणून या गोष्टी मनोभावे पाळतात.

रेवणसिद्धाची यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा इथे भरते आणि त्या यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून दुर्बिणीतून पाहिल्यास शिखर शिंगणापूरचं दर्शन होतं, असं सांगितलं जातं. मंदिराच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर गायमुख आहे. रेवणसिद्ध मूर्तीसमोर भव्य असा नंदी आहे. (Temples)

दगडी गुंड

मंदिरात नंदीमहाराजांसमोर एक दगड आहे. त्याला गुंड्या म्हणतात. हाताच्या तीन बोटांनी तो दगड उचलला जातो. असं म्हणतात की, मनात असलेली इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड तीन बोटात अलगद उचलतो. पण जर इच्छा पूर्ण होणार नसेल तर मात्र तो दगड जागचा हालतही नाही.

अमरावती शहरालगतच्या डोंगरांमध्ये 5 हजार वर्षापासून उभे आहे 'कोंडेश्वर मंदिर'; जाणून घ्या इतिहास

 https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/amravati/history-of-kondeshwar-temple-near-amravati-city/mh20230210182539586586026
ETV Bharat

5 हजार वर्षापूर्वीपासून उभे आहे कोंडेश्वर मंदिर

अमरावती : कोंडेश्वराचे मंदिर विदर्भ राजाच्या काळात उभारण्यात आल्याचे सांगण्यात येते. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी या परिसरात राज्य असणाऱ्या विदर्भ राजा हे काशी क्षेत्रातील भगवान विश्वेश्वराचे भक्त होते. या विदर्भ राजाने आपल्या विदर्भ प्रदेशात कौंडिय मुनीच्या आग्रहावरून शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. या शिवलिंगाला कोंडेश्वर असे नाव देण्यात आले.

असा आहे कोंडेश्वर मंदिराचा इतिहास : कोंडेश्वराजवळ प्राचीन काळी अनेक वेळा काशी ,प्रयागराज, ओमकारेश्वर आणि अन्य स्थानावरून ऋषीमुनी, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, साधुसंत, भाविक, शिवभक्त येत असत. यामुळेच शिव उपासनेचा सुगंध या परिसरात सर्वत्र आजही दरवळतो. अनेक राज्यसत्तांच्या काळात श्रीक्षेत्र कोंडेश्वराचा उत्कर्ष झाला. वाकाटक आणि गुप्तकाळात कोंडेश्वर येथील मंदिराची प्रतिष्ठा वाढली. रामदेवराव यादव आणि कृष्णदेवराव यादव या घराण्यातील राज्य सत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान असणाऱ्या हेमांद्रीपंत यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यापैकीच त्यांनी कोंडेश्वर येथील विद्यमान मंदिर राज्यसत्तेच्या खर्चाने बांधले. या मूळ मंदिराला लावलेले शिलाखंड व त्यावरील कोरीव काम पाहता यावर दक्षिणेकडील कलाकृतीचा पगडा असल्याचे दिसते.

कोंडेश्वराला मनाचे स्थान : यादवकाळानंतर 400 वर्षांनी औरंगजेबाच्या मोगली सत्तेत इतर मंदिरांप्रमाणे कोंडेश्वरच्या मंदिरालाही अवकळा प्राप्त झाली होती. अमरावतीकर भोसलेंच्या ताब्यात हा भाग आल्यावर कोंडेश्वराला पुन्हा मनाचे स्थान मिळाले. माधवराव पेशव्यांच्या काळात अभिषेक, शिवलीलामृत पाठ, अन्नदान, नाम सप्ताह अशा धार्मिक विधी वाढल्याने कोंडेश्वराचे महात्म्य पुन्हा एकदा वाढले. काळ्याभोर पाषाणाचे चिरे एकावर एक रचून हे मंदिर बांधण्यात आले. हेमाडपंथी स्वरूपात उभारण्यात आलेल्या या मंदिराची उंची पूर्वी 12 फूट इतकीच होती. पुढे या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी पूर्वी असणाऱ्या काळापाषाणाचाच वापर करून मंदिराची उंची 75 फूट करण्यात आली.

जागृत देवस्थान : कोंडेश्वर हे विदर्भातील काही प्रसिद्ध घराण्यांचे कुलदैवत ही मानले जाते. भाविक कोंडेश्वराच्या गाभारा जलामृत्ताने भरण्यासाठी अनेकदा प्रयत्न करतात. कोंडेश्वरावर पाण्याची सतत धार सुरू राहते. मात्र, कोंडेश्वराचे लिंग पूर्णपणे पाण्यात कधीही बुडत नाही. मंदिरातील पाणी बाहेर जाणार नाही याची सर्व दक्षता घेतली जाते. गाभाऱ्याचा तळ भाग चुन्याचा पक्का बनविला असतानाही हजारो लिटर पाणी नेमके कुठे जाते याचा शोध आजवर लागलेला नाही. कोंडेश्वर हे जागृत देवस्थान असल्याची मान्यता आहे. गाभाऱ्यात कोंडेश्वर बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांची स्थापना देखील करण्यात आली आहे.

दगडावर कोरलेल्या हत्तींचे वैशिष्ट्य : कोंडेश्वर मंदिराच्या बाहेरून बसविलेल्या दगडी चिऱ्यांवर अगदी पायथ्याशी हत्ती कोरलेले आहेत. अतिशय कलात्मक रचना असणाऱ्या या हत्तींच्या दोन शरीरांना एक मूक तर काही ठिकाणी दोन मुखांना एकच हत्तीचा देह दिसतो . यामुळे या कोरलेल्या हत्तींची निश्चित संख्या किती हे समजणे कठीण आहे. हे हत्ती एका बाजूने मोजत गेल्यास या हत्तींची जेवढी संख्या भरते तेवढीच संख्या दुसऱ्या बाजूने मोजत गेल्यास भरत नाही.

तपश्चर्या करणारा नंदी : कोंडेश्वराच्या गाभाऱ्याकडे जाताना एक भला मोठा नंदी गाभाऱ्याच्या खाली उतरणाऱ्या द्वारासमोर आहे. अग्र पूजेचा मान असणाऱ्या नंदीची बैठक ही जणू तो तपश्चर्या करीत असल्याचाच भास होतो. कोंडेश्वराच्या मंदिर परिसरात अति पुरातन काळातील गणपती मंदिर आणि हनुमानाचे मंदिर देखील आहे.

Friday, February 23, 2024

शिखर शिंगणापुर माहिती ( अंतिम )

 
 शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत. सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर शंभू महादेवाच्या डोंगररांगेतील शिखरावर हे मंदिर प्रचीन काळा पासून प्रसिध्द आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात शिखर शिंगणापूर येथे प्राचिन स्वयंभू शिवमंदिर आहे. माण तालुक्यातून जाणार्‍या डोंगररांगेला महादेव डोंगररांग म्हणतात. या डोंगररांगेत वारूगड, वर्धनगड, महिमानगड, कल्याणगड हे किल्ले आहेत. याच रांगेच्या एका फाट्यावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर शिखरशिंगणापूरचे प्राचिन मंदिर आहे. शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शाेधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला 'दक्षिण कैलास' असे म्हणतात. 

durmil_photo

  पुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.
आजही दरवर्षी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुध्द अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
इतिहासात डोकावल्यास देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजाने हे गाव वसविले होते. त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे. 
शिखर शिंगणापूर
    शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्‍या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी गावात मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतिर्थ असे म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.
 
 
 
  पुर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचा जिर्णोध्दार झाला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्यतज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्‍या आहेत.


या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. शिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत.
 
 
 lipi
 
पूर्वीच्या पायऱ्यांच्या रस्त्यावरून मंदिराकडे येताना एक भरभक्कम वेस लागते. हि वेस शिवाजी महाराजांनी मंदिर जीर्णोधाराच्या वेळी बांधली असून तिला 'जिजाऊ वेस' असेही म्हणतात. वेशीतून आत येताना एक अतिशय सुंदर आणि तेवढाच भक्कम दरवाजा लागतो. त्याला 'शेंडगे दरवाजा' म्हणतात. शिखर शिंगणापूरचे दर्शन घेताना त्याच्या सभोवतालच्या निसर्गाची व तेथील अनमोल इतिहासाची जाणीव होते. 

 
 
 
 Shikhar Shinganapur TempleShikhar Shingnapur Temple
 
 deep_maal
 
 
शेंडगे दरवाजा ओलांडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत पोहचतो. तेथेच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते. मंदिरा बाहेर दोन दीपमाळ आहेत ज्या शिवाजी महाराजांनी बांधल्या आहेत. यातील एक दीपमाळ महाराजांनी आपल्या सेविकेच्या नावाने बांधली असून त्यांचे नाव “विरू बाई” होते. प्रत्येक मंदिरात गणपतीला स्थान असते. तसेच येथेही गाभाऱ्या बाहेर गणपतीची प्रतीष्ठापणा केली आहे. या गणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट महणजे येथे दोन फिरते दगडी खांब आहे. पुरातन शिल्पा कलेचा अनोखा नमुना येथे पाहायला मिळतो. मंडपाच्या एका भिंतीवर कलींया मर्दनाचे सुंदर शिल्प कोरलेले दिसते.
डाव्या हाताला नगारखाना आहे आणि समोरच पंच नंदीचे दर्शन आपल्याला घडते. पूर्वी येथे एकच नंदी होता नंतर कोणा एका भक्ताने आपला नवस फेडण्यासाठी चार नंदी अर्पण केले. नंदीच्या दर्शनानंतर आपण मुख्य मंदिराकडे निघतो. मंदिराच्या पायरी वर आपल्याला नतमस्तक पार्वती दिसते. लोटांगण घातलेली पार्वतीचे शिल्प चांदी मध्ये कोरलेले असून अतिशय देखणे आहे, शंकराला शरण गेलेली पार्वती यात दिसते. त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. 

मंदिरा बाहेरील नंदी दगडाचा असून त्यावर आता पत्रा बसविला आहे. नंदीचा मंडप शंभर कमळाच्या बनविला आहे. अनेक वेगवेगळ्या अख्यायिका येथे ऐकायला मिळतात. सोरटी सोमनाथ मंदिरातील गडगंज संपत्ती लुटण्यासाठी गजनीच्या मोहमदाने असंख्य वेळा या देवळाच्या व देवाचा विध्वंस केला. यापैकी एका आक्रमणाच्या वेळी तेथील सोमनाथाचे लिंग सौराष्ट्रातून महाराष्ट्रात आणून ते शिंगणापूर  येथे स्थापले गेले अशी अख्यायिका आहे. आजही महाराष्ट्राशिवाय कर्नाटकातून अनेक भक्तजन शिंगणापूर यात्रेला येतात. ते लोक या महादेवाला आपले कुलदैवत मानतात.लिंगाचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारतांना महादेवाच्या मंदिरा मागे अनेक लहान देवळे दिसतात. एका देवळात प्रचंड मोठो घंटा दिसते. हि घंटा पंच धातूची असून पोर्तुगीज चर्च मधून आणली असावी असा अंदाज आहे. या घंटा वर रोमन अक्षरात सतराशे वीस असे लिहिले आहे. 
या मंदिर संकुलातील शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे म्हणजे भोसल्यांचे ही दैवत असल्यामुळे त्यास विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. मंदिराचा एकूण परिसर अंदाजे एक एकर असावा. मंदिरात जाण्यासाठी सुमारे १५० पायर्या चढाव्या लागतात. परंतु आता रस्त्याची सोय केल्याने गाड्या सरळ मंदिरापर्यंत जातात.
 
 



Shikhar Shinganapur Temple
येथील फक्त दोनच मंदिरे भव्य असून त्यावर विटांनी बांधलेली भूमीज शिखरे आहेत. यातील मुख्य मंदिर शंभू महादेवाचे असून ते पडल्यामुळे मराठा काळात नव्याने बांधण्यात आले.मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार असून तीन उप प्रवेशद्वार आहेत. दक्षिणे कडील प्रवेशद्वारातून बळी मंदिराचे दर्शन घडते तर पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून शिवाजी महाराजांचं स्मृती स्थळ पाहायला मिळते.
Shikhar Shingnapur Temple
 
 
Smruti Mandir, Shikhar Shingnapur
 मंदिराच्या दक्षिण दिशेल सुमारे शंभर यार्डावर दुसऱ्या टेकडी वर दगडी बांधकाम आढळून येते. येथे तीन स्मारके आहेत. एका ओळीत असणारी हि स्मारके दक्षिणेकडे तोंड करून आणि पूर्व पश्चिम विस्तारलेली आहेत. पश्चिमे कडील स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून, मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील संभाजी महाराजांचे आहे. ऑगस्ट १६८९ मध्ये संभाजी महाराजाची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर गादीवर आलेल्या शाहू महाराजांनी या स्मारकाची बांधणी केली.
    या मंदिराचा तलविण्यास, स्तंभ आणि द्वारशाखा या बाबी यादव स्थापत्याशी मिळत्याजुळत्या असल्या तरी त्यातील शिल्पे आणि भूमीज शिखराचा खालचा भाग यावरुन सध्या अस्तित्वात असलेले मंदिर मध्ययुगात बांधले असल्याची साक्ष देतात. या मंदिराला एकाखाली एक अशी तीन शुरसेनके असून शुकनासेच्या पातळीपर्यंत स्तंभकोट आहेत. 
 dagdi_khamb
 
 portuguese_ghanta
        या मुखमंडपाच्या दक्षिणेला किंचित खालच्या पातळीवर अमृतेश्वर मंदिर आहे. एक मुख मंडप आणि दोन अर्धमंडप असलेला मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविण्यास आहे. मंदिर उंच जगतीवर उभे आहे या जगतीला कोणतेही अलंकरण नसलेला खूर प्रकाराचे थर आहेत. या थराच्या प्रवेश आणि निर्गमामुळेच या भागाला काहीसा उठाव आलेला आहे.
    मंदिराचा तलविण्यास पंचरथ प्रकारचा असून या मंदिराचे स्वरूप नव भूम भूमीज प्रसाद असे आहे. मंदिर दोन भागात विभागले गेले आहे. मूळ गाभारा आणि बाहेरचा सभा मंडप.
        मुख मंडपात आणि दोन्ही अर्ध मंडपात जाण्यासाठी पायऱ्या आहेतच. प्रथम या पायऱ्या जगतीच्या पातळीपर्यंत जातात. त्या पातळीवरील थोडी जास्त रुंद जागा असून तेथून परत पायाला सुरुवात होऊन त्या मुख्य मंडपापर्यंत किंवा अर्धमंडपापर्यंत जातात. मुख मंडप आणि अर्ध मंडपाच्या बाह्य अंगावर मात्र जाड्य, कुंभ, खूर आणि जाडंब असे ठळक थर असून प्रत्येक दोन थरांच्या मध्ये अंतर पत्रांचा थर आहे. त्याच्यावर कलश आणि मंची हे भाग येतात. मंडपातील स्तंभ आणि मुखमंडप व अर्धमंडपातील अर्धस्तंभ एकाच प्रकारचे म्हणजे एकाच घटक क्रमाचे आहेत. त्रिकोणी नक्षी असलेला चौरस तळखळा, अष्टकोनी पट्ट आणि त्यावर चौरस घटक, त्यावर कुंभ, त्यावर कलश, आकार शीर्ष आणि त्यावर नागशीर्ष हस्त असे या स्तंभाचे स्वरूप आहे. काही घटकांवर विशेषतः अष्टकोनी घटकावरील पट्ट्यावर जाळीदार नक्षी आहे. त्यांचे एकंदरीत स्वरूप शिलाहार आणि होयसाळ स्तंभाशी स्पष्ट साधर्म्य दाखविते.सभा मंडपाचा आकार चांदणी प्रमाणे आहे. मंडपाला भिंतीचा आधार नसून तो बारा भक्कम खांबांवर बांधला गेला आहे. सध्या अनेक लहान खांब आधारासाठी बांधले आहेत.
 
मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे.  संपूर्ण मंदिराच्या खांबांवर पुराणातील अनेक कथा शिल्प रुपात कोरलेल्या आहेत. एका शिल्पात स्त्री शिकार करताना दर्शवली आहे. तसेच कुत्र्यांचा वापर शिकारी साठी दाखवला आहे. एका शिल्पात पुरुषाने बंदूक वापरताना कोरलेला आहे काही खांब हे फुल-वेलीच्या नक्षीत कोरलेले आहेत.  खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्‍या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. या प्रकारच्या शिल्पांना कुट शिल्प म्हणतात.  मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. 
 

 

 
Carving on the pillar of Shikhar Shingnapur Temple

Shikhar Shinganapur Temple
 
 Shikhar Shinganapur Temple
 
   मंडप आणि गर्भगृहाच्या द्वारांना पाच ते सहा शाखा आहेत. मधली शाखा स्तंभ शाखा असून त्यावर उत्तरांग पेललेले आहे. उत्तर अंगावर तीन अर्थीका असून त्यात देवदेवतांच्या ऐवजी चौकट नक्षी आहे. हे मंदिर १४ व्या शतकाच्या सुरुवातीस बांधले गेले असे दिसते.


      मंदिराच्या गाभार्‍या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्‍याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे.
        मंदिराच्या गर्भगृहावर विटांचे भूमीज शिखर असून त्यावर चुन्यात केलेली कलाकुसर आहे.  शिखराच्या नासेवरील चुन्यातील कोरीव काम आणि त्याचप्रमाणे स्तंभकुठावरील कोरीव काम लक्षात घेता ही निर्मिती दक्षिणात्य स्थपतींची असली पाहिजे याविषयी शंका उरत नाही. गंडभैरुंड प्रयोजने आणि शूरसेनकांमध्ये कोरलेली वेसर शिखरे याचे स्पष्ट पुरावे आहेत. मंदिराच्या मागील बाह्यांगावर बसवलेले मध्ययुगीन स्तंभकोट, सध्याचे विटांचे शिखर ही नंतरच्या काळातील निर्मिती असल्याची साक्ष देतात. आधीच स्पष्ट केल्याप्रमाणे गर्भगृहावरील विटांचे भूमीज शिखर विजयनगर काळातील आहे. शिखराच्या तीन लतांच्या खालच्या भागात एक ऐवजी दोन शूरसेनके आहेत. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराप्रमाणेच याही मंदिराच्या शूरसेनाकात शिखर प्रतिकृती आहे. उदाहरणार्थ मंदिराच्या मागील बाजूच्या शूर सेनाकात उठावात कोरलेले वेसर शिखर आहे. 
Smruti Mandir, Shikhar Shingnapur

      मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे. मंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास “बळी महादेव” म्हणून देखील ओळखले जाते.या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे.मंदिराचे प्रवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे. मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे. रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो. मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे.

शिखर शिंगणापूर मंदिराचा रोजचा दिनक्रम

स. ६.०० : काकड आरती करून देवाला उठवले जाते.

दु.१२.०० : देवाची आरती  रा.८.०० : सांज आरती करून मंदिर बंद केले जाते.

रा. ९.०० : शेजारती 
प्रत्येक आरती नंतर जंगमने केलेल्या पदार्थांचा नेवेद्य दाखवला जातो. देवाच्या झोपण्या साठी ब्राह्मण देवाच्या शयनाची पूर्ण तयारी करतो. शयना साठी गादीवर व्याघ्रांबर घातले जाते. देवाच्या उशाला पाण्याचा तांबा, दोन पानाचे विडे ठेवले जाते.

देवस्थानाचे वर्षभराचे कार्यक्रम:
     महाशिवरात्री: महाशिवरात्री हि शंकराच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहण्याचा मोठा कार्यक्रम असतो. महाशिवरात्रीचा महोत्सव पाच दिवस चालतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो.
वारी : दर अमावास्येला शिखर शिंगणापूरची वारी असते. अनेक भक्तगण अमावास्येला महादेवाचे दर्शन करून मग गुप्तलिंगाला भेट देऊन आपापल्या घरी परततात. आषाढी वारीला नियमित जाणाऱ्या वारकऱ्याप्रमाणे भक्तगण महादेवाच्या वारीला येतात.

यात्रा: यात्रा म्हणजे देवाचे लग्न. हा वार्षिक उत्साव अतिशय नयन रम्य असा सोहळा असतो. त्याची अनुभूती याची देही याची डोळा पहावी.

आध्यात्मिक महत्त्व

शिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. चैत्र शु. अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाहाचा मुख्य सोहळ्यांपैकी असतो. तत्पुर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून (हळकुंड ) हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वर्‍हाडी म्हणून येतात आणि शंभु महादेवाला व पर्वतीमातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभु महादेव मंदिराचे शिखर (कळस) बांधून ते श्री अमृतेश्वर (बळी ) मंदिराचे शिखर (कळस ) यांना पागोटे (सुताची जाड दोरी) बांधले जाते.अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. 
      यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी ५५० फूट लांब पागोटे विणले जाते. यांस शंभु महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. आणि रात्री १२ वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभु महादेव आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा “हर हर हर महादेव” च्या जयघोषात पार पाडला जातो. चैत्र शुद्ध एकादशीस इंदोरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राज घराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात कि देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही.राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेऊन देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली, राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते.  शिखर शिंगणापूरची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी हि पहिलीच यात्रा असावी. 
       
श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अदभूत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. कावड म्हणजे उभी पताका, त्यावरती बांधलेले डौलात हलणारे वनगायीचे केस, खांदा देण्यासाठी मागे आणि पुढे खांदे, खांद्याच्या मधील जोडणीला बसवलेले पाण्याने भरलेलं दोन तांब्याचे, पितळेचे कलश (रांजण) , नंदीची लहानशी मूर्ती आणि उभा करण्यासाठी चार समांतर पाय. तर काठ्या म्हणजे फक्त मोठी काठी आणि बांधलेली पताका ती एक माणूस डोक्यावर उचलून घेऊ शकतो. तर कावडींच्या आकारानुसार खांद्याला दोन किंवा चार लोकं लागतात दोराला दोघे चौघे सोबतच असतात. वेगवेगळ्या गावांच्या कावडीचा आकार आणि त्यांची बांधणी वेगवेगळी असते.
        बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावडभुतोजी तेली यांची असते.भुतोजी तेली यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रे अगोदर हि मानाची कावड सासवड वरून प्रस्थान करते. फार पूर्वीपासून हि प्रथा चालू आहे. देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेऊ नये ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्थित होणार नाही. या विचारापोटी भुतोजी तेली शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या घरादारास आग लावीत असत. निसंकोच मनाने आणि देवाच्या ओढीने त्यांची कावड द्वादशीला शिंगणापूरच्या पायथ्याशी पोहचत असे.
  तरुणांचा सहभाग या पायी वारी मध्ये लक्षणीय असतो, चालत असताना पुढचे टप्पे आणि खांदेकरी ठरलेले असतात, ठरलेल्या वेळेपर्यंत पुढच्या गावात कावड खांद्यावर घेऊन पोहचवली जाते. वाटेतील गावांमध्ये या चालणाऱ्यांसाठी गावकरी स्वइच्छेने अन्नदान करतात. शेतामध्ये असणाऱ्या काकड्या, कलिंगडे, खरबूज, लिंबूसरबत ही वाटप करत असतात. निंबळकच्या कॅनॉल वर तासभर पोरं पोहतात आणि तिथून मग बरड वरून पुढे जात विसाव्याची (ठिकाणचे नावच विसावा आहे) वाट पाहत डोळे आतुरलेले असतात.
      बरड ते विसावा अंतर लवकर तुटत नाही तिथं तुमच्या शारीरिक क्षमतांचा कस लागतो, उन्हाची तीव्रता कमी झालेली असते पण चालून चालून शरीर थकलेले असतं.  विसाव्यावर आल्यानंतर कावडीची आरती होते. एकावर एक पाच सात छोटी चपटी दगडी मांडून लोक विसाव्याची खूण मांडतात. त्यानंतर कावड मुक्कामाच्या ठिकाणी पोहचते.  दुसऱ्या दिवशी लवकर उठून आंघोळ नाश्ता करून कावडी कोथाळे गावात महादेव मंदिरापाशी येतात आणि तिथं कावडी हलगी आणि डफड्याच्या तालावर नाचवल्या जातात, तरूण मोठ्या उत्साहाने त्या लयबद्ध तालावर नाचत असतात, वेगवेगळ्या गावांच्या कावड्यांची आणि वादकांची जणू नाचण्याची स्पर्धाच तिथं होत असते. कोथळे गावात गुलालाची उधळण करून कावड मुंगी घाटाच्या पायथ्याला येऊन विसावते.

    दुपार नंतर हि कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे द्रुश्य फारच मोहक असते. मुंगी घाट म्हणजे खालून पहिलं तर वर जाणारी माणसं ही मुंगी सारखी लहान आणि रांगांनी चाललेली दिसतात म्हणून त्याला मुंगी घाट बोलतात असं जेष्ठ लोकांकडून सांगितलं जातं. घाट चढायच्या आधी थोडावेळ सगळे विसावा घेतात. तोंडाला कोरड पडू नये म्हणून आपल्या कावडी सोबतच्या लोकांना तोंडात ठेवायला लिंबू आणि लेमन गोळ्या दिल्या जातात. कावडीला पुढं अधिकचा मोठा दोर बांधला जातो आणि हर हर महादेव… म्हणत कावड घाट चढायला चालू करते. जवळपास अश्याच शेकडो कावडी एकाच वेळी घाट चढत असतात. कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. कावड सहा कवड्यांच्या खांद्यावरून नेली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. मौज म्हणून कवड्यामध्ये रस्सीखेच खेळली जाते. कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जन कावडीचे दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे.
   व्यवस्थापन करणारे जेष्ठ घाट चढताना कावडीला खांदेकरी हे काटक, चपळ आणि अनुभवी लोकांना ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, दोरीलाही अनुभवी आणि काही नवखे तरुण असा मेळ घातला जातो. “हर हर महादेव… हरहर बोला…” च्या वातावरणात संपूर्ण घाट शिवमय झालेला असतो. “म्हाद्या धाव, म्हाद्या धाव… लोकांना सांभाळ” असंही एकेरी धावा काही जेष्ठ महादेवाच्या प्रेमापोटी करत असतात त्यात त्या भक्ताच्या आणि महादेवाच्या निर्मळ नात्याचा प्रत्यय येत असतो.
   शेवटच्या टप्प्यावर सरळ पंधरा ते वीस फुटाचा अखंड खडक आहे तिथं खांदेकरी आणि दोरीच्या माणसांची खरी परीक्षा असते. पुढे दोरीला तरुणांकडून खेचलं जात असतं आणि पुढच्या खांदेकऱ्याला ९० डिग्रीत खडकाला पाय देऊन चढावं लागतं त्यामुळे त्याच्या खांदा आणि पाय दोन्हीवर एकाच वेळी ताण येतो, मागच्या खांदेकऱ्याला कावडीला घट्ट धरून चपळाईने वरती यावं लागतं तर कावडीच्या पायांना धरून वर जाण्यासाठी मागच्या लोकांची तिघांची घाई चाललेली असते. हरररर बोला… म्हणत तो टप्पा पूर्ण होतो. तेलोजी भुते ही मानाची कावड तर कोणत्याही दोराचा आधार न घेता मानवी हातांच्या साखळीने सगळ्यात शेवटी चढवली जाते.
  कावड घाट चढून वरती येते आणि तयारीत असणारे डफडे वाले आणि हलगी वाले वाजवायला सुरू करतात तिथं विजयाचा आनंद, महादेवाच्या भेटीची उत्सुकता नाचून साजरी केली जाते. तिथून पळतच कावड वरील देवळांना भेटी देत मुख्य महादेव मंदिरा समोर आणून पुन्हा नाचवली जाते. पाण्याचे कलश (रांजण) सोडून मंदिरामध्ये नेले जातात. आणि त्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घातला जातो, पावसासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. दोनचार दिवस चालून आलेला शीण महादेवाच्या भेटीने नाहीसा होतो.

    तिथून कावडी कावडी तळाकडे प्रस्थान करतात. एक दिवस मुक्काम करून चालतच रेडे घाटाने परतीच्या वाटेला  चालू लागतात.  तर काही आपापल्या सोयीने ट्रॅक्टर मधून मानकऱ्यांच्या घरी, गावात येवून विराजमान होतात. असा हा शंभू महादेवाच्या कावडीचा सोहळा अनेक आठवणी, अनुभवांसह संपन्न होतो. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असा हा पायी वारीचा सोहळा असतो जिथं जातपात, धर्म, गरीब, श्रीमंत अशी कोणतीही भिंत न पळता ‘ शंभू महादेवाचा भक्त’ या एका शब्दाखाली माणसं माणूस म्हणून एकत्र येतात. सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी धोंड्याच्या मुंगी घाटातूनच वर मार्ग काढतात. मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. पूर्वी जेव्हा भुतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपवून घरी जात त्यावेळी त्यांचे घर व दार सर्व सुखरूप असे. आजही भुतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात. येताना प्रतीकात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड शिखर शिंगणापूरच्या दिशेने चालू लागते. द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरु होतो. सार्वजन भक्तीत न्हाऊन आपापल्या घरी जातात. असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही आहे. दरम्यान, श्रावणात या तीर्थस्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
         श्री शंभू महादेवाची लीला अपरंपार आहे. यातच श्री शंभू महादेवाच्या चमत्काराची प्रचीती येते. सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात. तुम्हीही या सोहळ्यात शामिल व्हा आणि देवाचा हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पहा मगच तुम्हाला श्री शंभू महादेवाच्या अस्तित्वाची खरी प्रचीती येईल.

गुप्तलिंग महादेव मंदिर - हे निर्जन शिव मंदिर शिखर शिंगणापूर शिव मंदिरापासून सुमारे 3 किमी अंतरावर आहे. या गुप्तलिंग मंदिरापेक्षा शिखर शिंगणापूर मंदिर जास्त प्रसिद्ध आहे. ही दोन्ही मंदिरे छत्रपती शिवाजी महाराज घराण्याशी जोडलेली आहेत. जवळच असलेले दुसरे महत्त्वाचे शिवमंदिर म्हणजे अमृतेश्वर मंदिर.

गुप्तलिंग शिव मंदिराची आभासी सहल:

श्री क्षेत्र गुप्तलिंग महादेव मंदिराचा महाद्वार. शिखर शिगणापूरप्रमाणेच हे मंदिरही महान राजा शिवजी महाराज घराण्याशी जोडलेले आहे. उदयनराजे भोसले हे मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आहेत.



मंदिराच्या मुख्य दरवाजातून दिसणारे दृश्य. 

महादेव मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला सुमारे १००-२०० पायऱ्या चढून खाली जावे लागते. वाटेत काही शिव आणि पार्वती मातेच्या मूर्ती आहेत.

वाटेत आणखी एक सुंदर पुतळा.

हे दूरवरून मंदिराचे दृश्य आहे (मागील फोटोवरून पहिले उजवे वळण घेतल्यानंतर पायऱ्या ). डावीकडे दरी असून त्यामधून पाण्याचा प्रवाह वाहत आहे आणि उजव्या बाजूला खडकाळ डोंगर आहे.

डोंगराच्या उजव्या बाजूचे दृश्य.

डोंगराचे डावीकडे दृश्य.

गुप्तलिंग शिव मंदिराजवळ येत आहे.

गुप्तलिंग महादेव मंदिर. हे एक छोटेसे मंदिर आहे जे गुप्त शिवलिंगासाठी ओळखले जाते.

मंदिराच्या गाभाऱ्यातील मुख्य शिवलिंग .तुम्ही या वरील फोटोमध्ये एक संगमरवरी टाइल काढलेली पाहू शकता. या शिवलिंगाच्या अगदी खाली ठेवलेले गुप्त शिवलिंग अनुभवण्यासाठी टाइल काढली जाते. त्यामुळे याला गुप्तलिंग महादेव मंदिर म्हणतात.

या शिवलिंगाच्या खाली पाणी आहे. टाइल विस्थापित करून बनवलेल्या या पोकळीत तुम्हाला तुमचा ताणलेला हात पूर्णपणे ठेवावा लागेल. 2 ते 2.5 फूट अंतरावर, शिवलिंग उलट्या आकारात जाणवते. असे म्हणतात की केवळ भाग्यवान लोकच त्याला स्पर्श करू शकतात. 


मंदिराच्या परिसरात आणखी काही शिवलिंगे आहेत आणि त्यामागे महाराजांची नावे आहेत.

राम सेतू पासून तरंगणारा दगड . लंकेत जाण्यासाठी भगवान राम सैन्याने समुद्रावर बांधलेल्या पुलावरील दगड.
राम सेतूतून तरंगणारा दगड. जेव्हा लोकांनी या दगडावर नाणी फेकले जाते तेव्हा त्याचा आवाज येतो. त्यामुळे घन दगड दिसते.

मंदिराच्या मागे खडकाळ डोंगर आहे. या डोंगरातून एक अतिशय लहान पाण्याचा प्रवाह मंदिराजवळून जात आहे.
भगवान शिव - हर हर महादेवाची स्तुती करत या आभासी मंदिर प्रवासाचा शेवट होतो .

जावे कसे ? :-

 फलटण- 36 किमी, बारामती- 50 किमी, पंढरपुर- 83 किमी, सतारा- 85 किमी, दौंड- 94 किमी, जेजुरी- 99 किमी, कोल्हापुर- 160 किमी, पुणे- 151 किमी, तुलजापुर- 197 किमी)
   पुण्याहून फलटण गाठावे. फलटण - दहीवडी रस्त्यावर मोरोची येथे शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी फाटा आहे. फलटण - शिखर शिंगणापूर अंतर ६४ कि.मी. आहे.  

आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
१) वारूगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले शिखर शिंगणापूर मंदिरा बरोबर एका दिवसात पाहाता येतात.
२) गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ.
३) फलटण येथील महादेवाचे मंदिर, राम मंदिर, राजवाडा.
४) अकलूजचा किल्ला ४५ किमी.
सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.

माळशिरस तालुक्‍यातील इतर धार्मिक स्थळे

  • अकलूज येथील अकलाई देवी, शिव- पार्वती मंदिर, आनंदी गणेश

  • महाळुंग येथील यमाई देवी

  • वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर, भाईनाथ महाराज समाधी मंदिर

  • माळशिरस येथील झोपलेला मारुती

  • मेडद व कारुंडे येथील काळभैरव

  • दहिगाव येथील जैन धर्मीयांचे भगवान महावीर स्वामी मंदिर

  • शिंगणापूर येथील गुप्तलिंग मंदिर 

संदर्भ :-

१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३)  www.trekshitiz.com   हि वेबसाईट
४)  https://vijaysardehindi.blogspot.com
५) https://www.santsahitya.in
६) https://www.esakal.com
७) https://marathispeak.in
८) http://satarainfo.in/
९) https://samantfort.blogspot.com
१०) https://www-thespiritualindian-com

हे मंदिर शिंगणापूरच्या शिखरावर (शिखर) असल्यामुळे त्याला शिखर शिंगणापूर असेच म्हटले पाहिजे. शिवभक्तांनी भेट द्यावी अशी आणखी दोन शिवमंदिरे आणि या मंदिराच्या अगदी जवळ आहेत ती म्हणजे अमृतेश्वर मंदिर आणि गुप्तलिंग मंदिर (सुमारे ३ किमी अंतरावर)


हे मंदिर महान राजा शिवजी महाराज कुटुंबाशी जोडलेले आहे. या मंदिरात शिवजी महाराज वारंवार येत असत.


या मंदिरात कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नाही. प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते.

शिखर शिंगणापूर मंदिर

हा फोटो मी मंदिराबाहेर क्लिक केला आहे. या वरील फोटोमध्ये या मंदिराविषयी अनेक तथ्ये दर्शविली आहेत.

1. मंदिरात अनेक शिवलिंगे (सुमारे 8) आहेत. त्यामुळे या मंदिराला दक्षिण कैलास असेही म्हणतात.
2. आतल्या गाभाऱ्यात मला दोन शिवलिंग दिसले. या मंदिरात तुम्हाला वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 शिवलिंग आणि 5 नंदीच्या मूर्ती दिसतील.
3. मार्च-एप्रिल महिन्यात येथे मोठी जत्रा किंवा "जत्रा" भरते. यावेळी अनेक भाविक व कावड मुंगी घाटाने मंदिरात येतात. कवड्यांनी आपल्या कवड्यांमध्ये आणलेल्या पाण्याने शिवलिंगाला स्नान घालावे. महाशिवरात्री उत्सवात अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.
4. पौराणिक कथेनुसार, येथे भगवान शिव आणि पार्वती माँ यांचा विवाह झाला होता.

शिखर शिंगणापूर शिव मंदिराची आभासी सहल:

शिखर शिंगणापूर मंदिर

शिखर शिंगणापूर हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर आहे. मंदिर दगडात बांधले आहे पण आता रंगाने रंगले आहे. काँक्रीटचा रस्ता मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी जातो. जेव्हा मी मंदिराला भेट दिली तेव्हा मंदिराकडे जाणारा अतिशय सुस्थितीत असलेला रस्ता पाहून मला धक्काच बसला. स्थानिक लोकही दुसऱ्या मार्गाने पायऱ्या चढून या मंदिराला भेट देतात.

जर तुम्ही गावातून या ठिकाणी पायऱ्या चढून भेट देत असाल. मग वाटेत तुम्हाला पुष्करतीर्थ कुंड (शिवाजी महाराजांनी बांधलेले) आणि गणेश मंदिर पहायला मिळेल.

शिखर शिंगणापूर मंदिर

शिखर शिंगणापूर मंदिर

शिखर शिंगणापूर मंदिर

मंदिराच्या संरचनेत अनेक देवता आणि देवता सुंदर कोरलेल्या आहेत. मंदिरात अनेक प्रकाश बुरुज आहेत.

शिखर शिंगणापूर मंदिर परिसर

शिखर शिंगणापूर मंदिराचे प्रांगण (मंदिराच्या डावीकडे). मंदिराच्या भिंती काळ्या दगडाने बांधलेल्या दिसतात.

शिखर शिंगणापूर मंदिर

मंदिराच्या प्रांगणाची उजवी बाजू.

शिखर शिंगणापूर मंदिर

शिखर शिंगणापूर मंदिर डोंगराच्या अगदी माथ्यावर आहे. त्यामुळे तुम्हाला देशाच्या बाजूचे उत्कृष्ट दृश्य पाहता येईल. पावसाळ्यात ते खूप सुंदर असेल.

शिखर शिंगणापूर मंदिर

मंदिराच्या शिखरावरून आणखी एक दृश्य.

हर हर महादेव.

शिखर शिंगणापूर मंदिरात कसे जायचे:
पुण्यापासून 153 किमी, फलटणपासून 41 किमी आणि पंढरपूरपासून 84 किमी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.

चिन्हांकित जवळपासच्या धार्मिक स्थळांसह अंदाजे नकाशा स्थान:

शिखर शिंगणापूर मंदिरापासून जवळ असलेल्या अमृतेश्वर मंदिर आणि गुप्तलिंग मंदिराला भेट द्यायला विसरू नका.




https://www-thespiritualindian-com.translate.goog/guptlinga-temple-guptlinga-mahadev-temple/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc

































हे.




गुप्तलिंग मंदिरात कसे जायचे - हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण उपविभागात आहे. पुण्यापासून अंतर १५३ किमी, फलटणपासून ४१ किमी आणि पंढरपूरपासून ८४ किमी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे.



https://www.thespiritualindian.com/guptlinga-temple-guptlinga-mahadev-temple/

 


















































मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...