https://incredibleheritage.com/2023/05/10/solapur-jilhyatil-varasa-sthale/
सोलापुर जिल्ह्यातील वारसा स्थळे
सोलापूर जिल्ह्यात पर्यटन विकासाची क्षमता असलेली अनेक ठिकाणे पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील काही ठिकाणांची माहिती येथे दिली आहे. बहुमुखी शिवलिंग, हरि-हरेश्वर मंदिर आणि हत्तरसंग कुडल संगम येथील श्री संगमेश्वर मंदिर,वेळापूर येथील अर्धनारीनटेश्वर मंदिर परिसर आणि वीरगळ यांचा समृद्ध संग्रह, अक्कलकोट येथील युनिक शस्त्रास्त्र संग्रहालय, कैकाडी महाराज, पंढरपूर , माचनूर, ता. मंगळवेढा येथे सिद्धेश्वर मंदिर आणि औरंगजेबाने बांधलेला मध्ययुगीन किल्ला आणि इतिहास आणि पुरातत्व संग्रहालये ही महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ठिकाणे पाहिली पाहिजेत.

हत्तरसंग कुडल -दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे गाव वसलेले आहे . कुडल संगम असेही या ठिकाणाला म्हटले जाते म्हटले जाते .अद्वितीय वास्तुकला आणि शिल्पकला यांनी नटलेले हरिहरेश्वर मंदिर आणि आद्य मराठी शीलालेखासाठी प्रसिद्ध असलेले श्री संगमेश्वर मंदिर या ठिकाणी आहेत. याशिवाय 359 शिवप्रतिमा असलेले बहुमुखी शिवलिंग, कालिया मर्दन शिल्प, एक चेहरा व पाच शरीरे असलेले शिल्प येथील मंदिरांमध्ये आहेत. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्गरम्य पर्यटनासाठीही हत्तरसंग कुडल आदर्श पर्यटन स्थळ आहे.
अधिक माहितीसाठी हत्तरसंग कुडल लेख- https://incredibleheritage.com/2023/05/10/hattarsang-kudal-maharashtra/
वेळापूर:- अर्धनारीनटेश्वर मंदिर माळशिरस तालुक्यामध्ये पालखी मार्गावर वेळापूर हे गाव वसलेले आहे. येथील अर्धनारीनटेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. याशिवाय या गावात विविध राजवटींनी अनेक प्राचीन व मध्ययुगीन मंदिरै बांधलेली आहेत. कर्नाटकातील ऐहोळे व पट्टदकल प्रमाणे येथील मंदिर परिसराचा विकास केल्यास वेळापूर राष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येऊ शकेल.
Velapur Live Location- https://maps.app.goo.gl/AeBoLYFi6ui3TseM7
वीरगळ संग्रह( Hero stone)वेळापूर येथे भारतातील सर्वात मोठा वीरगळ संग्रह( Hero stone) आहे. सर्व वीरगळ वर्गीकरण करून वस्तुसंग्रहालय उभारल्यास भारतातील ते एकमेव आणि भव्य वीरगळ वस्तुसंग्रहालय होऊ शकते.

New Palace Live Location– https://maps.app.goo.gl/zjPT6VM8Zmp6bpWr7
अक्कलकोट -सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील नवीन राजवाडा येथे हे शस्त्रास्त्र संग्रहालय आहे. अक्कलकोट संस्थानचे फत्तेसिंह भोसले तृतीय यांचा हा संग्रह आहे. यामध्ये अनेक तलवारी, भाले, धनुष्यबाण, बंदुकी, तोफा व इतर दुर्मिळ वस्तूंचा प्रचंड संग्रह आहे. आशिया खंडामधील सर्वात मोठे शस्त्रास्त्रांचा संग्रह असलेले हे संग्रहालय आहे. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांनी विशेषतः विद्यार्थी व संशोधकांनी या संग्रहालयास भेट दिलीच पाहिजे.

Kaikadi Maharaj Mandir Live Location– https://maps.app.goo.gl/whNLXHNKLxdVktfF6
पंढरपूर शहरात कैकाडी महाराज मठ आहे. रामायण, महाभारत, पुराणकथा, भारतातील व महाराष्ट्रातील संत परंपरा व वारकरी संप्रदाय, भारतीय स्वातंत्र्य चळवळ या विषयांवरील कथा शिल्प संग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण इमारतीमध्ये निर्माण केलेले आहे. विठू माऊलीच्या दर्शनानंतर पर्यटकांनी विशेषतः विद्यार्थी, संशोधक व इतिहास प्रेमीनी कैकाडी महाराज मठाला अवश्य भेट द्यावी .

Machnoor Live Location- https://maps.app.goo.gl/QEZM8GqQUAb1jFkc7
मंगळवेढा तालुक्यात भीमा नदीच्या काठावर माचणूर हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. या ठिकाणी श्री सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच मुघल बादशाह औरंगजेबचे वास्तव्य सन 1695 ते 1699 या काळात माचणूर येथे होते. त्यावेळी औरंगजेबाने या ठिकाणी किल्ला बांधला. या काळात मुगल साम्राज्याचा कारभार येथूनच चालत असे. ज्येष्ठ संशोधक गोपाळराव देशमुख यांनी संशोधन करून ग्रंथ प्रकाशित केला आहे. येथील सर्व सर्व स्थळांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करता येईल.
सोलापूर जिल्हा व शहर येथील वारसा स्थळे –
सोलापूर जिल्हा ऐतिहासिक ,सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन आणि आरोग्य पर्यटनाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्ह्यात अकरा तालुके आहेत 1.पंढरपूर 2.अक्कलकोट 3.बार्शी 4.मोहोळ 5. माढा6.मंगळवेढा 7.माळशिरस 8.करमाळा 9.सांगोला 10.दक्षिण सोलापूर 11.उत्तर सोलापूर
पंढरपूर तालुक्यातील वारसा स्थळे-पंढरपूर शहर-* महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, *कैकाडी महाराज मठ, *गोपाळपुर, *विष्णुपद ,*हरे कृष्ण मंदिर पंढरपूर तालुका -* पखालपूर गणेश मंदिर, *कासेगाव येथील मंदिरे, *सूर्यनारायण मंदिर
अक्कलकोट तालुक्यातील वारसा स्थळे –अक्कलकोट शहर-*श्री स्वामी समर्थ मंदिर, *शस्त्रास्त्र संग्रहालय, न्यू पॅलेस, *अन्नछत्र मंडळ, *राजेराय मठ अक्कलकोट तालुका-*शिवपुरी अग्निहोत्र केंद्रा ,*काशी विश्वेश्वर मंदिर, जेऊर, *मल्लिकार्जुन मंदिर, चपळगाव ,*मल्लिकार्जुन मंदिर, नागणसूर ,*बुऱ्हाणपूर
बार्शीतालुक्यातील वारसा स्थळे *श्री भगवंत मंदिर, बार्शी शहर ,*धामणगाव येथील संत बोधले महाराज समाधी मंदिर
मोहोळतालुक्यातील वारसा स्थळे *मोहोळ येथील नागनाथ मंदिर, *वडवळ येथील नागनाथ मंदिर
माढा तालुक्यातील वारसा स्थळे *माढा शहरामध्ये माढेश्वरी देवी मंदिर ,*मध्ययुगीन गढी, *अरण येथील श्री संत सावता माळी समाधी मंदिर
मंगळवेढा तालुक्यातील वारसा स्थळे *माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिर, *सिद्धापूर येथील मातुलिंग गणपती
माळशिरस तालुक्यातील वारसा स्थळे- अर्धनारीनटेश्वर मंदिर, वेळापूर,*अकलूज येथील सयाजीराजे पार्क, अकलूज,*आनंदी गणेश मंदिर -अकलूज,*अकलाई देवी मंदिर -अकलूज,*शिवसृष्टी ,अकलूज –Video प्रा. चंद्रकांत चव्हाण https://youtu.be/_bzT3EHjrOc
करमाळा तालुक्यातील वारसा स्थळे *करमाळा शहरातील कमलादेवी मंदिर,*96 पायऱ्यांची विहीर ( बारव) .सैराट चित्रपटातील अनेक प्रसंग या परिसरात चित्रित करण्यात आले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वारसा स्थळे -हत्तरसंग कुडल येथील हरिहरेश्वर मंदिर आणि श्री संगमेश्वर मंदिर
उत्तर सोलापूर तालुक्यातील वारसा स्थळे-*नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य
सोलापूर शहरातील वारसा स्थळे–
*श्री सिद्धरामेश्वर मंदिर,*भुईकोट किल्ला,*डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारक,*इंद्र भवन (वैशिष्ट्यपूर्ण वास्तू ),*सिद्धेश्वर वनविहार,*स्मृती उद्यान ,*महात्मा गांधी प्राणी संग्रहालय
सोलापूर शहर व जिल्ह्यातील वस्तूसंग्रहालये–1. महर्षी दयानंद सरस्वती वस्तुसंग्रहालय, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर 2. पुरातत्व विभाग ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर3. शस्त्रास्त्र संग्रहालय ,न्यू पॅलेस ,अक्कलकोट4. कैकाडी महाराज मठ- ऐतिहासिक व पौराणिक कथाशिल्प संग्रहालय ,पंढरपूर
मंगळवेढा किल्ला
मंगळवेढ्याचा इतिहासः-
इ.स. सन १००० ते १२०१ :-
मंगळवेढे गावची ऎतिहासिक परंपरा अतिशय मोठी असून, अशी परंपरा लाभलेली गावे फारच कमी आहेत. मंगळवेढा हे गांव कधी काळी वसले याबद्दल निश्चित पुरावा नाही. परंतू फार प्राचीन काळी शालिवाहन शकाच्या सुरुवातीला मंगळवेढा हे शहर मंगल राजचे अधिपत्याखाली होते. या गावची बाजारपेठ त्यावेळी अतिशय भरभराटीत चालू होती. मंगल राजाच्या अगोदर हे गांव जीवनपूरी असे म्हणून प्रसिध्द होते. सध्याच्या मंगळवेढ्याच्या पश्चिम दिशेस जमिनीचे उत्खनन करताना सोन्या, चांदीचे दागिने, जून्या विठा, मातीची नक्षीदार सुंदर असलेली फुटलेले दगडी शिल्प अशा विविध वस्तू सापडत होत्या. परंतू कालांतराने जीवनपूरी या गावची वाताहत झाली. जीवनपूरीच्या पूर्वेस त्यावेळी निबीड असे अरण्य होते. त्यामुळे महाभयानक अशा अरण्यात मनुष्यवस्ती आजिबात नव्हती. जंगली हिंस्र स्वापदे व राक्षसांचे वास्तव्य त्या अरण्यात होते. व्दापारयुगात कौरव पांडवाच्या वेळी कौरवानी कपट दुताने खेळून पांडवाचे राज्य हिरावून त्यांना १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा दिली होती. तो वनवासाचा काळ भोगत असताना पाच पांडव धर्म, भिम, अर्जुन, नकुल व सहदेव फिरत फिरत त्या घनघोर अशा निबिड अरण्यात आले. महाभयानक हिंस्र पशुंच्या व क्रुर राक्षसांचे ते एक निवासस्थानच झाले होते. महाज्ञानी धर्म राजाने तेथील जमिनीची पाहणी केली. धर्म राजाने त्या जमिनीचा कस ओळखला. हे अरण्य नष्ट करून यातील जमीन सपाट केली तर निश्चितच येथे मनुष्यवस्ती होईल, लोक निर्भयपणे वावरतील, धर्मराजानी मनाचा ठाम निश्चय केला व अर्जुनास अनुज्ञा दिली. " अर्जुना, तुझ्या धनुर्विद्येच्या बळावर हे संपूर्ण घनघोर असे निबिड अरण्य जाळून टाक." धर्म राजाची आज्ञा शिरसावंद्य मानून अर्जुनाने धनुर्विद्येच्या जोरावर ते संपूर्ण अरण्य जाळून बेचिराख केले. परंतु तेथील जमीन उंच सखल भागात असल्यामुळे एक सपाट भाग जमीन दिसेना. ही जमीन सपाट कशी करायची? हे जिकीरीचे कष्टाचे व ताकदीचे काम कोणी करायचे? "माझ्या भिमाशिवाय हे काम करण्याची ताकद कोणात नाही", हे धर्म राजाने जाणले व भिमास पाठीवर थाप मारून सांगितले, " भिमराया तुझ्या महाकाय गदेने ही जमीन सपाट कर." धर्मराजाची आज्ञा मिळताच भिमाने प्रचंड गदेच्या प्रहाराने भिमा नदीपासून पश्चिमेकडील संपूर्ण जमीन भूईसपाट करून टाकली. परंतू हे काम करताना ती प्रचंड महाकाय गदा झिजून गेली. त्यामुळे भिमाने ती गदा भिमानदी व माणनदीच्या संगमात टाकून दिली. (सद्या भिमा व माणनदी संगमावर सरकोली हे गांव वसलेले आहे). व्दापारयुग संपले. नंतर कालांतराने बरीच वर्षे लोटली. नदीच्या प्रवाहाच्या पाण्याने संगमातील वाळू कमी होऊन त्या प्रचंड महाकाय गदेचे झिजलेले लाकूड उघडॆ पडले. ही परिस्थिती जुन्या जाणकार लोकांनी पाहीलेली होती अशी एक लोक अख्यायिका आहे.
भिमा नदीच्या पूर्वेकडील जमीन सपाट करून पाच पांडव या प्रदेशातून वनवासाचा काळ व्यथित करत मजल दरमजल करत हस्तिनापूरात पोहोचले. पुढे कौरव पांडवाची घनघोर अशी लढाई होऊन त्या लढाईत कौरवांचा नाश झाला आणि धर्म राजा हस्तिनापूरचा राज्यकारभार पाहू लागले. धर्मराजाने न्यायनितीने राज्य करून सारी जनता सुखी केली. पुढे कालांतराने अर्जुनाचा नातू परिक्षीत राजाने पांडवानंतर हस्तिनापूरचे राज्य चांगल्या रितीने केले. परिक्षीत राजाचा मुलगा जनमेंजय हस्तिनापूरचा राजा झाला. जनमेंजयाने बरीच वर्षे राज्य करून भारत खंडातील जनता सुखी केली. जनमेंजयानंतर बराच कालखंड गेला. व्दापारयुगात यादवी माजून श्रीकृष्णाचा यदुवंश नष्ट झाला. सारी जनता हवालदिल झाली. श्रीकृष्णाचे अवतार कार्य संपून कलीयुगास सुरुवात झाली. लोक दैनवान्या स्थितीत वाट दिसेल तिकडॆ मार्गस्थ होऊन चरितार्थात काफील्यानी राहू लागले. दक्षिणगंगा भीमा नदीच्या पश्चिमेकडील सपाट जमिन पाहून बरेच काफीले येथे येऊन राहू लागले. सपाट व सुपीक काळ्याभोर जमिनीत कष्ट करून भरपूर उत्पन्न निघू लागले. त्यामुळे हळूहळू याठिकाणची लोकवस्ती वाढू लागली. लोक या ठिकाणी घरे बांधून गुण्या गोविदांने जीवन कंठू लागले. मोठमोठे वाडे, सुंदर महाल व गावाकडेने मजबुत अशी तटबंदी बांधून परचक्र व चोरांपासून संरक्षण व्हावे म्हणून तटबंदीच्या बाहेरील बाजूनी खोल असा खंदक खणून शत्रू सैन्यास सहजासहजी गांवात प्रवेश मिळू नये म्हणून संरक्षण केले. शत्रू टेहाळणीसाठी गावच्या चारी दिशेस उंच असे बुरुज बांधले गेले. जसजसा कालखंड जाईल तशी या गावची बाजारपेठ भरभराटीस येऊन व्यापार वाढून या गावची किर्ती दुरवर पसरली. लांबलांबचे व्यापारी या गावाशी संबंध जोडून मोठ मोठी सोन्या चांदीची दुकाने थाटून गावाच्या वैभवात आणखीन भर टाकली. दिवसेंदिवस या शहराचे वैभव वाढू लागले. त्यावेळचा नक्की कालखंड कोणता होता याचा पुरावा लागत नाही. परंतु या शहराचे वैभव व भरभराटीचा काळ हा शालीवाहन शकाचे अगोदरचा असावा. एवढे वैभवशाली सुंदर व भरभराटीचे आलेले सुखी, संपन्न शहर आपले आधिपत्याखाली असावे, या शहराचा सम्राट आपण व्हावे, यावर आपली सत्ता असावी म्हणून मंगल नावाच्या राजाने या शहरास आपल्या सैन्यानीशी चोहोबाजूनी वेढा दिला. परंतू मजबूत तटबंदी असल्यामुळे मंगलराजाचा काही इलाज चालेना, तरीपण मंगल राजाने आपल्या सैन्याचा वेढा बराच काळ उटविला नाही. सरते शॆवटी गावाची रशिद बंद पडली. तेथील अंमलदार अखेर राजास शरण येऊन ते शहर मंगल राजाचे अदिपत्याखाली आले. मंगल राजाने सैन्यानीशी वेढा देऊन हे शहर जिंकून घेतले. तेंव्हापासून या शहराचे नाव मंगळवेढा असे पडले, अशी लोक अख्यायिका आहे.
मंगळवेढे शहरातील सर्वात जूनी प्राचीन सुंदर वास्तू म्हणून किल्ल्यामागील काशीविश्वेश्वराचे मंदीर असा उल्लेख करता येईल. तेथील मुळचे देऊळ इ.सन. १० व्या व ११ व्या शतकात म्हणजे चालुकय कलचुरीचे उत्तर काळात अथवा यादवांचे अधिपत्याखाली बांधले गेले असावे, कारण देवळाचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीप्रमाणे आहे. यादवोत्तर काळात हे मंदीर मोडकळीस आले होते. पुढे मुसलमानी राजवटीत विजापूरच्या गादीवर आल्ली अदिलशाह असताना हिप्परगीचे श्री. बाहयानी धनाजी कुलकर्णी यांनी शके १४९४, इ.स. १५७२ साली मंदीराचा जिर्णोध्दार केला. याची हकीकत रंगशिळेच्या डावीकडील खांबावर पाच भागात कोरली आहे. मुळ लेख ६० ओळीचा असून जसाचा तशा न देता सलग देत आहोत.
शिलालेख
श्री. गणेशायनम: आदौ कर्ता। तर्तो सौंहर्ता तदनंतर जीवाना जठर भर्ची गौरी। भर्ता पुनान तुमाम॥--॥ स्वस्ती श्री जय अभ्युदय शालिवाहन शके १४९४ प्रवर्तनामे ॥ -- ॥ अंगीरस नाम ॥ संवस्तरे दक्षिणायने १) वर्षा ॠतो भाद्रपद मासी शुक्ल पक्ष । तृतिया स्थिरचंद्र वासरे तत्काळे हस्त नक्षत्रे साध्य नाम योगे, तैतिला करणे । धनुलग्ने, अस्मीन पुण्य दिवसी । श्री निजभक्त श्रीमंत भारद्वाज गोत्र, कात्ययन सुत्र, शुक्ल युजू २) शाखा ध्यायचे, लाहयानी धनाजी हिप्परगे कळे येथील कुलकर्णी ॥ विजापूर देशाचे परगणे ॥ मंगळवेढे ॥ यांचे स्थळी. मुन्मू । करिता वेळे कसबे मध्ये । जोगी बावी सान्निधाने जुने देऊळ पडले, ते जिर्णोध्दार करुन, श्री काशीविश्वनाथ लिंग प्रतिष्ठापना करून ३) तिरणभट उपाध्येशी अनगर कराशी देवाची पुजा व अध्यायन सांगावया करणे ठेवले. त्यासी स्वस्ती देसाई हिरॊजी व कसगावडा वा मळशेट्टी होनरावू वा मळकोजी वा आनंद पटेलासी सांगितले. । त्यांने यासो मुठी केला. । प्रजाभागामध्ये चालवू. म्हणून वाक सुकृत दिधले असे. ४) पुढे यासी साक्षी बोयाजी भगरावा तिमाजी सौकळ कुलकर्णी. कसबेचा पुजा. गुरोजी संबंध नाही. त्याने धुपारतीने वेळे मांधळ वाजवून नेवैद्य द्यावा. विडा दक्षिणेसी सबंध नाही. हे वोळासी विळ होवून चौधीरचा नरसो पटेल. अंगीकार असे यासी जो दुसरे कोणी येईल त्याचे वंशवरी गाढव असे. ॥ मुल्ला याकूब काढले असे. तुका कुलकर्णी.
शिलालेख - संकलन
श्री गोविंद रघुनाथ सबनिस.
शालीवाहन १० वे शतकात या मंदीराचे जिर्णोध्दार, भारद्वास गोत्रातील धनाची हिप्परगी यांनी केला. असा शिलालेखाचा उल्लेख आहे. श्री काशिविश्वेश्वर मंदीराचे बांधकाम शालिवाहन ७ व्या शतकात झाले असावे. मंदीरावरील दगडी देव देवतांचे शिल्प फारचे पुरातन काळातील आहेत.
मंदीराजवळील विहीर त्याच वेळी बांधली असावी. कारण शिलालेखात मंगळवेढे यांच्या स्थळी- मुन्मु करता वेळे कसबेच्या जोगी बावी सान्निध्याने जुने देऊळ पडले असा उल्लेख आहे. विहिरीचे बांधकाम सुध्दा अतिशय पुरातन काळातील आहे. विहीरीतीळ देव देवतांच्या मुर्ती जीर्ण झालेल्या आहेत. ( जगातील बह्मदेवाच्या तीन मुर्तीपैकी एक ब्रह्मदेवाची मुर्ती विहीरीतील कमानीत पूर्वाभिमुख बसविली आहे) यावरून मंगळवेढ्याची एतिहासिक परंपरा फार प्राचीन काळातील असावी. ब्रह्मदेवाच्या मुर्तीशेजारी एक भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग मंगळवेढ्याच्या पश्चिमेस कृष्ण तलाव नावाचा एक तलाव आहे. हा तलाव कोणी खोदला याचा पुरावा सापडत नाही. परंतू तलावाच्या मध्यभागी गोपाळकृष्णाचे पुरातन असे सुंदर मंदीर बांधले होते. विहीरीतील भुयारी मार्ग या गोपाळ कृष्णाच्या मंदीरापर्यंत आहे. अशी लोक अख्यायिका आहे. ही अख्यायिका सत्य असावी. कारण महाराष्ट्र शासनाने १९७२ साली जो दुष्काळ पडला त्यावेळी कृष्ण तलावाचे उत्खनन केले. त्यावेळी तलावाच्या मध्यभागी गोपाळकृष्णाच्या मंदीराचे जुने अवशॆष मोठमोठ्या शिळा भंगलेले दगडी शिल्प, मंदीराचा चबुतरा पडीक अवस्थेत आहे. अजून त्या ठिकाणी मंदीराचे जुने पडीक बांधकाम पाहवयास मिळते. मंगळवेढ्याच्या ऎतिहासिक परंपरेचा अतिशय जुना इतिहास म्हणजे दक्षिणेस १ कि.मी. अंतरावर माळावर एकविरा देवीची फार प्राचिन काळी बांधलेले जुने मंदीर आहे. मंदीरासमोर उंच दिपमाळ बांधलेली असून भग्न अवस्थेतील दगडी हत्ती व दैत्याची मूर्ती आहे. हे मंदीर कोणी बांधले व केंव्हा बांधले याचा नक्की पुरावा सापडत नाही. देवीची मुर्ती (मुकवटा) भव्य असून रागीट भाव चेह-यावर आहेत. देवी अत्यंत जागृत असून मुर्तीसमोर शकून पाहण्याचे दोन गोल असे दगड आहेत. मंदीराच्या बांधकामाचे बाहेरील बाजूच्या दगडावर पुसट असा शालीवाहन सात असा मजकूर होता. परंतु तो दगडही ऊन, पावसाळ्यामुळे खराब होऊन जीर्ण झाला आहे. यावरून हे मंदीर १५०० वर्षापूर्वी बांधलेले असावे. महाराष्ट्रात एकविरा देवीची मंदीरे फार थोडी आहेत. या मंदीराचे बांधकाम मोठ मोठ्या शिळाचे, दगडाने बारीक घडई करुन मजबूत बांधले आहे. मंदीरावर घुमटया आकाराचे शिखर आहे. एकविरा मंदीराच्या आसपास आता देव देवतांची बरीच मंदीरे बांधली आहेत. देवीच्या मंदीराच्या दक्षिणेला द-याबाचे मंदीर आहे. उत्तरेकडील बाजूस यल्लमा देवीची नवीन तीन मंदीरे बांधली आहेत. दक्षिणकेदार जोतिर्लिंगाचे सुशोभित भव्य असे मंदीर असून समोर उंच अशी दिपमाळ दिमाखात उभी आहे. जोतिबाच्या मंदिराचे उत्तर दिशेस काळभैरवनाथाचे मंदीर आहे. दरवर्षी या देव देवतांचे भव्य अशा मंदीर परीसरासमोर चैत्र महिन्यापासून नवरात्र महोत्सवापर्यंत भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रात नऊ दिवस याठिकाणी भाविक येतात. दस-यादिवशी शिमोलंगनासाठी भाविक भक्तांची अलोट अशी गर्दी असते. त्यादिवशी एकविरादेवीचा माळ भाविक भक्तांचे जयघोषाने दुमदुमुन गेलेला असतो. संताच्या पदस्पर्शाने व देवदेवतांचे वास्तव्याने पुनित झालेल्या मंगळवेढे नगरीचा एतिहासिक परंपरेचा ठेवा अगदी थोडक्यात काही लोक अख्यायिकाच्या आधारे व पौराणिक माहीतीच्या आधारे दिला आहे. मंगळवेढा गावाची एतिहासिक परंपरा फार मोठी आहे. अशी परंपरा असलेली गावे फारच क्वचित आढळतात. हे गाव कधी वसले याबद्द्ल निश्चित माहीती मिळत नाही. पूर्वीच्या शिलालेखावरून एक हजार वर्षांपूर्वी हे गांव राजधानी असून त्यावर कल्याणीचे चालुक्य घराण्यातील सम्राटांचा अंमल होता. इ.स. १०६० ते ११२१ पर्यंत या गांवी कलचुरी घराण्याचे राज्य होते व मंगळवेढा राजधानी होती. श्री बसवेश्वर (लिंगायत धर्माचे मूळ संस्थापक) हे त्या विज्जल राजाचे प्रधान होते. त्या बिज्जलचा आजोबा कलचूर्य घराण्यांतील जगत व पेरमाडी यांनी या ठिकाणी महामंडलेश्वर म्हणून राज्य केले आहे. तेंव्हा या शहराचे वैभव फार मोठे होते. वैदिक, जैन, शैव, वैष्णव वगैरे अनेक पंथांचे व संस्कृतीचे हे संगमस्थान होते. त्यावेळी येथे व्यापारी पेठ होती. त्या वेळची येथील लोकसंख्या हजारापेक्षा जास्त होती. गावात सुंदर देवळे होती. देवगिरीचे यादव पन्नास वंशातील राजा भिल्लम याने मंगळवेढे येथील कलचुरी घराण्याच शेवटचा राजा बिल्हण याचा इ. सन ११९१ मध्ये नाश केला.
इ.स. १४०० ते १५००
देवगीरीचे यादव घराण्याचे बहामनी राजाने पराभव केल्यानंतर मंगळवेढे बहामनी राज्यात सामील झाले. बहामनी राज्याचे वेळीच इ.स. १४५८ ते १४६० या साली श्री. दामाजी पंतांचा प्रसिध्द दुष्काळ पडला व श्री. दामाजीपंत त्यावेळी तेथील तहसिलदार असल्यामुळे भुकेने व दुष्काळाने पीडीत झालेल्या लोकांकरीता त्यांनी पेवे लुटविली. त्याकरीता बादशहाने त्यांना कैद केले असता पंढरीच्या पांडुरंगाने विठु महाराचे रुप घेऊन दरबारात पैसा भरला व श्री. दामाजीपंतांची सुटका केली. नंतर मोगल सरदार बहादूर जिलाणी याने मंगळवेढे आसपासचा मुलूख जिंकला व मंगळवेढे दिल्लीचे मोगल अंमलाखाली इ.सन. १४६५ ते १४७५ पर्यंत होते. इ.सन १४९३ मध्ये मंगळवेढे येथे भुईकोट किल्ला बांधला गेला व हे एक प्रमुख व मजबूत लष्करी ठाणे म्हणून प्रसिध्द झाले. ता. ५/११/१४९४ रोजी बिदर बादशहा महबूबशा यांने स्वारी करून बहादूर जिलाणीचा पराभव करून व त्यास ठार मारून मंगळवेढे पुन्हा जिंकून आपल्या ताब्यात घेतले. इ.स. १३९६ ते १४०८ अशी बारा वर्षे दुर्गा देवीचा दुष्काळ या भागात पडला, त्यात मंगळवेढे ही सापडले. नंतर इ.स. १४२२ व १४२३ आणि इ.स. १४६७ ते १४७४ यासाली दोन मॊठे दुष्काळ पडून मंगळवेढे गावाची वाताहत झाली. दुष्काळामध्ये लोक गाव सोडून गेले, देश हैराण झाला. २० वर्षे मंगळवेढे गांव पडीक राहीला. गावात थोडीच घराणी राहीली म्हणून परगावातून व लांबून मॊठी घराणी येथे आणुन त्यांना जमिनी देऊन पुन्हा वसाहत करावी लागली. नागांवचे प्रतापरुद्र इंगळे यांना आणुन देशमुखी करून दिली.
आलूर अचालेरे येथून भानशेट होनराव यांस आणून देशमुखीच्या तीन तक्षिमा करुन दिल्या. अनग-यातून कोयाजी बीन नागदेव यांस आणुन देशमुखीच्या चार तक्षिमा केल्या. विठठल कसगावडा, चंडरस कुलकर्णी ही घराणी गावांतच होती. त्यांना पाटील कुलकर्णी वतने दिली. परगावाहून खालील......
फुगारे, भगरे, हजारे, जठार, उन्हाळॆ, कौंडुभैरी, धावलिंग, मुरडे, ताड, टकले, आयवड, शहाजादे, कानुइंगळे, तानगावडे, तीपनाईक, कसगावडे, गवळी, चौगुले, नाडगौडा, बोधले, जोगण, जावळे, बहीरजी, ढवण, जोशी, काटकर, घाटूळ, घुले, चौधरी, महाजन, खराडे, वाकडे, भांगे, आवताडे, उमाटे, गुंगे, मुदगुल, बोमण्णा, वठारे, यादवाडचे होनमाने इत्यादी घराणी मंगळवेढ्याला आली.
या लोकांनां ज्या ज्या भागात जमिनी दिल्या तेथील झाडी तोडून जंगल साफ करून त्यांनी शेती केली. त्या त्या स्थळाला त्यांची नावे दिली असून आजही मंगळवेढे शिवारातील जमिन अमक्या स्थळात आहे अशी ओळखली जाते. सर्व स्थळे मिळून ७२ भागात मंगळवेढेची जमीन वाटली गेली आहे. इ.सन. १४८९ मध्ये मंगळवेढे गांव जिंकून विजापूरच्या अदिलशाहीने आपल्या राज्यात सामिल केला.
इ. सन. १६०० ते १७००
इ.सन. १६०० ते १७०० या शंभर वर्षात मंगळवेढे पुन्हा भरभराटीस आले. प्रमुख लष्करी ठाणे म्हणून ओळखले जाऊ लागले. अकबराचा सरदार मीर जयाउद्दीन मुस्ताफाखान मंगळवेढ्यास इ.सन. १६०३ मध्ये रहात होता. त्याचा अंमल आजू बाजूचे पन्नास कोसावर चालत असे. म्हणून हा किल्ला हस्तगत करण्याकरिता वारंवार लढाया होत असत. विजापूरचा सरदार सर्जाखान व मोगल सरदार जयसिंगराजे यांची या किल्ल्याकरिता लढाई झाली. त्यावेळी श्री छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूरचे विरुध्द मोगल सरदारास मदत केली होती. ता. १८/१२/१६६५ रोजी मंगळवेढे किल्ल्यात श्री छ्त्रपती शिवाजी महाराज व राजे जयसिंग यांची भेट झाली होती. नेताजी पालकर यांनी विजापूर दरबाराविरुध्द मोठी लढाई करून विजापूर दरबारचा पराभव केला. पण पुन्हा ता: ३१/०५/१६६६ साली हा किल्ला विजापूर दरबाराकडे गेला. श्री छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी पुन्हा तो जिंकून घेतला. इ.सन. १६९५ ते १७०२ औरंगजेबचा मुक्काम मंगळवेढ्यापासून नऊ मैलावर बेगमपूर येथे होता. बॉम्बे गॅझेटीअरवरून असे दिसते की, मंगळवेढे गाव पुर्वी तीन भागात विभागले होते. १) किल्ला २) कसबे ३) शनिवार पेठ. पेठ केंव्हा वसली याची निश्चित माहीती नाही. सध्याचे वार्ड क्रं. १ व वार्ड क्रं २ यास कसबे म्हणत होते. त्या कसब्याभोवती इ.स. १६९४ साली गावकूस बांधले. त्याची एकंदर लांबी ६९३६ फूट व रूंदी ८ फूट होती. त्याच्या पुर्वेस बोराळे नाका, नेऋत्येस सांगोला नाका व उत्तरेस बुरुज १२० फूट उंच व १४ फूट व्यासाचा होता, असे चौरंग बुरुज होते. भुईकोट किल्ल इ.स. १४९३ साली बांधला त्याची लांबी उत्तर दक्षिण अंगास १२४५ फूट, पूर्व अंगास १२०० फूट व पश्चिम अंगास ९२० फूट आहे. तट १३ फूट रुंदीचा व ३५ फूट उंचीचा होता. त्यास सात बुरुज होते त्यांची नावे--- मर्दान, करड, चौफाळा, जगभावी, गच्ची,कैकाड आणि बोराळ. सर्वात मोठा बुरुज मर्दान नावाचा असून त्याची उंची ५७ फूट व व्यास ५० फूट आहे. तो सध्याचे लक्ष्मीनारायण देवळासमोर होता. किल्ल्याभॊवती खंदक ८२ फूट रुंद होता. पुर्वेस मुख्य वेस असून ती १४ फूट उंच व १२ फूट रूंद होती.
इ. सन १७०० ते १८००
इ. सन १७०० नंतर मोगल अंमल संपून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. श्री छत्रपती शाहू महाराज यांनी राजे पांढरे यांना प्रमूख नेमले. इ.सन. १७०८ ते १७४२ पर्यंत त्यांचा अंमल होता. त्यानी सध्या उभी असलेली चौबुर्जी इ.स. १७२० ते १७३० पर्यंत बांधली. ही चौभुर्जी मुख्य किल्ल्यातील आतील बालेकिल्ला आहे. तो चौकोनी असून प्रत्येक बाजूची लांबी २३० फूट आहे. भिंत १८ फूट उंच असून ८ फूट रूंद आहे. त्यास रणमंडळ रहाट, भूत व बडेखान असे चार बुरुज असून ते २५ फूट उंच व ३० फूट व्यासाचे आहेत. तटाचे रणमंडळ बुरुजावर तास वाजवित असत म्हणून त्या बुरुजास तास बुरुज असे म्हणू लागले. सध्या करंदीकर वकील राहतात त्यांच्या घराजवळील हा रणमंडळ बुरुज होय. इ. सन. १७४२ ते १७५० पर्यंत पंतप्रतिनिधीचा अंमल असून यमाजी शिवदेव हे येथे सरदार होते. इ.सन. १७५० पासून प्रथक कमाविसदार म्हणून मंगळवेढ्यास आले. नंतर गोविंद हरी पटवर्धन यांच्या सरंजामांत हा किल्ला इ.सन १७५१ साली दिला गेला. पटवर्धनाचे मिरज व मंगळवेढे हे दोन महत्त्वाचे किल्ले होते. गोविंद हरी पटवर्धन यांच्यावर पेशवे दरबारची इतराजी झाली. त्यावेळी ते मंगळवेढे येथे किल्ल्यात येऊन राहीले होते. त्यावेळी त्यांनी श्री संत दामाजी महाराज यांची सेवा केली म्हणून त्यांना त्यांच्या कृपा प्रसादांमुळे जहागिर परत मिळाली अशी त्यांची श्रध्दा होती. पुरुषोत्तम दाजी पटवर्धन हे मघ:श्याम याचे नातू होते. ते मंगळवेढे येथे राहत असत. इ. सन १७५५ साली श्रीमंत नानासाहेब पेशवे, श्रीमंत भाऊसाहेब पेशवे व श्रीमंत दादासाहेब पेशवे हे मंगळवेढे येथे येऊन काही दिवस राहीले होते. त्यावेळी मंगळवेढे परगणा होता व आंबेगाव (सध्या आंबे-चळे म्हणुन असलेला गाव) मंगळवेढे परगण्याखाली होता. तो गांव त्यावेळी श्रीमंत पेशव्यांनी नारायण कृष्ण व पुरुषोत्तम कृष्ण यांना इनाम करुन दिला. श्री. पुरुषोत्तम दाजी हे श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा खून झाला त्यावेळी मंगळवेढ्यास राहात होते. दाजी मोठे शुर असून त्याचे वक्तृत्व चांगले होते. ते धाडसी असून पराक्रमी होते. म्हणून श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या वधानंतर त्यांच्या पत्नी गंगांबाईसाहेब या गरोदर असताना त्यांना संभाळण्याकरीता मुद्दाम श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांना नाना फडणिसांनी पुण्यास बोलावून नेले होते. दाजी मरण पावल्यानंतर त्यांच्या पत्नी आंब्यास राहावयास गेल्या. इ.सन. १७६३ मध्ये निजाम पंढरपूर लुटण्यास आला होता. पण मंगळवेढे येथील पटवर्धनांनी निजामास परत जाण्यास भाग पाडले. पहिली सरदारकी मिळाली. इ.सन. १८०८ पर्यंत मंगळवेढे हे पटवर्धण घराण्याकडे होते.
इ. सन १८०० ते १९००
इ. सन १८०८ ते १९०० मध्ये पटवर्धन घराण्याच्या वाटण्या होऊन मंगळवेढे तालूका श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर पटवर्धन यांचे वाटणीस गेला. इ.सन. १८१८ मध्ये मंगळवेढयाहून तीस मैलावर असलेल्या अष्टी गावी शेवटची मराठा व इंग्रज यांची लढाई होऊन मराठा साम्राज्य लयास गेले व पेशवे यांचे सेनापती बापू गोखले हे धारातिर्थी पडले.
आजही मंगळवेढे गावात सेनापती बापू गोखले यांचा वाडा पडक्या स्थितीत आहे. श्री संत चोखामेळा चौकातुन पुर्वेस मारवाडी गल्लीतून थोडे पुढे गेलो की आपणास उजव्या हातास तो वाडा आहे. आपल्या तलवारीचे तिखट पाणी इंग्रजास पाजून मराठी साम्राज्य टिकविण्याची खटपट करणारा हा शुर योध्दा मंगळवेढे येथे राहत होता. याचा अभिमान मंगळवेढे जनतेस आज पाहीजे. पण मंगळवेढ्याची जनता बापू गोखले यांना आज विसरली आहे व त्यांचे गावात कोठेही स्मारक नाही. मराठी राज्य गेले पण महाराष्ट्राचे मन इंग्रजानी संपूर्ण मारलेले नव्हते. इ. सन. १८५७ साली उत्तर भारतात स्वातंत्र्याचा प्रयत्न होताच त्याचे पडसाद ही मंगळवेढे गावात उठले. काही प्रत्यक्ष कृती करीत होते. इंग्रजी सरकार संशयावरुनही पकडून लोकांना त्रास देत होते. स्वातंत्र्य युध्दात भाग घेतला म्हणून मंगळवेढ्याहून श्री. नारायणराव नाना पटवर्धन, भास्करराव जंमखंडीकर, आलमसाहेब काझी व एक मराठी ग्रहस्थ यांना ता. १/१२/१८५७ रोजी पकडून सातारा येथे चौकशीकरीता नेले. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले. पहिले श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब नंतर श्रीमंत धुंडीराज तात्यासाहेब हे सांगली संस्थानाचे अधिपती झाले. त्यांना १८५९ साली मुखत्यारी आली. त्यांचे कारकार्दीत सांगली संस्थानाचा कारभार काही वर्षे ब्रिटीश सरकारखाली होता. इ. सन १८७६ पर्यंत हा किल्ला मजबूत व शाबूत होता. सांगली संस्थानात ब्रिटीश ऍडमिनिस्ट्रेशन आल्यामुळे जॉईंट ऍडमिनिस्ट्रेशन कॅप्टन वेस्ट यांनी किल्ल्याचे दरवाजे कायमचे पाडले व मेजर वॉलरने तट पाडला. तटाची माती व दगड लोकांनी नेली व खंदक ही बुजवला गेला. काही बुरुज पडले काही बुरुज मुद्दाम पाडले गेले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र झाले आणि १९/०२/१९४८ रोजी ज्यावेळेस सांगली संस्थानाचे भारतात विलिनीकरण झाल्यानंतर मंगळवेढे हे सोलापूर जिल्ह्याचा एक तालूका झाला.
श्री दामाजीपंत चरित्र :-
बहामनी राज्य
हसन गंगूने इ.स. १३४७ मध्ये बहामनी राज्य गुलबर्गा येथे स्थापले. इ.सन. १४२९ मध्ये बिदरला अहमदशहा याने राजधानी आणली. अहमदशहावल्ली या नावाच्या बादशहाने इ.सन. १४२२ ते १४३५ पर्यंत राज्य केले. सर्व बहामनी बादशहामध्ये हा चांगला बादशहा होऊन गेला. त्यावेळी बिदर येथे दामाजी म्हणून एक कारकून दरबारात चमकला. मुसलमानी राज्य बिदरला असल्यामुळे हिंदू लोकांना धर्म पाळण्यास फार अडचण पडत होती. दरबारामध्ये मुसलमान नोकरांबरोबरच हिंदू लोकांचाही भरणा होता. त्यातच दामाजीचीही नेमणूक बहामनी दरबारात झाली. त्यावेळी बिदरचा किल्ला संपूर्ण बांधून तयार झाला होता.
दामाजीपंतास रोज तख्त महालात बसून दफ्तर संभाळावे लागे व काम करावे लागे. पंचवीस वर्षे वय असले तरीही दामाजीपंतांचा चेहरा श्रध्दाळू व भाविक दिसत असे. रोज स्नान करून कपाळावर मोठा गंध लावण्याची त्यांची प्रथा होती. दरबारात येतानाही ते टिळा लावून येत असे. त्यामूळे चटकन ते लोकांच्या डोळ्यात ते भरत असत. त्यांची अंगकाठी व शरीरयष्टी कमवलेली होती. ते घोड्यावर बसण्यात पटाईत होते व दांडपट्टा चांगला खेळत असत. त्यांचे मोडी अक्षर मोत्यासारखे वळणदार होते. त्यामूळे त्यांच्या कामावर त्यांचे वरिष्ठ खूष असायचे. दामाजीपंतही प्रामाणिकपणे काम करायचे, त्यामूळे वरिष्ठांची त्यांच्यावर मर्जी बसली. अहमदशहावल्ली हे बादशहा चांगले असल्याने हिंदूच्या अंगचे गुणांचे सुध्दा ते कौतुक करायचे.
एकदा दफ्तरखान्यातील सर्व कारकून काम संपवून गेले तरी सायंकाळी दामाजीपंत काम करीत बसलेले आढळले.
बादशहा दामाजीपंतास म्हणाले..."अभी तक काम कर रहे हो?"
त्यावर दामाजी पंतानी उत्तर दिले..." आज का काम अबतक पुरा नहीं हुआ, वह पुरा कर रहां हूं। हर रोज काम पुरा करके ही घर जाने की मुझे आदत है ।"
हे ऎकून बादशहास फार आश्चर्य व आनंद ही झाला.
बादशहा म्हणाले.." इस तरह काम करके तुझे क्या मिलेगा? तुम्हारे साथ काम करने वाले सब चले गए।"
त्यावर दामाजीपंत म्हणाले... "काम का बदला देना ईश्वर के हाथ में हैं, मैं अगर मेरा फर्ज पुरा करूं तो उससे मुझे दिल की तसल्ली मिलती है।"
बादशहा म्हणाले..." तेरा ईश्वर कहॉं हैं?"
दामाजीपंत ..."मेरा ईश्वर हर जगह मौजुद है।"
या संभाषणाने बादशहा खूष झाला आणि त्यांनी दामाजीपंतांची बढती नायब तहसिलदार म्हणून केली.
अहमदशहावल्ली नंतर त्यांचा मुलगा अल्लाउद्दीन दुसरा बादशहा झाला. तो पराक्रमी होता. त्यांने बिदरचे साम्राज्य वाढवले. त्यावेळी दामाजीपंतास नायब तहसिलदार म्हणून सैन्यांबरोबर जावावे लागायचे.
वयाच्या ४० व्या वर्षी पंढरपूरच्या पाडूरंगाचे दर्शन घेण्याचा योग त्यांना प्रथम आला व पंढरपूरचा दिव्य सोहळा पाहून ते वारकरी पंथाचे अनुयायी झाले. पांडूरंगाचे निस्सीम भक्त म्हणून धार्मिक गोष्टीकडे विशॆष लक्ष देऊ लागले. गीतेच्या पठनाबरोबर ज्ञानेश्वरीचे वाचनही ते आवडीने करू लागले. त्यावेळी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व ठिकाणी उपलब्ध नव्हता, तरीही दामाजीपंतानी ती प्रत मिळवून त्याचे अध्ययन सुरु केले. दरबारातही हुशार, संत प्रवृत्तीचा अधिकारी म्हणून दामाजीपंतांची ख्याती झाली.
मंगळवेढ्यात आगमन
दामाजीपंतांची भार्या (पत्नी), सावित्रीबाई ही सुध्दा एक अनुरुप अशी साध्वी, सुशील, पतिव्रत्ता होती. सावित्रीबाईंनां लिहीणे वाचणे येत असे. लहानपणी ती आई-वडिलांना पोथ्या-पुराणे वाचून दाखवयाची. त्यामुळे तिला रामायण, महाभारत यामधील गोष्टी चांगल्या माहिती होत्या. तीसुध्दा श्रध्दाळू असल्याने, आलेल्या पाहूण्यांचा अतिथी सत्कार करणे, सुगृहिणी म्हणून चांगला प्रपंच करणे, दानधर्म करणे वगैरे गोष्टी ती व्यवस्थितपणे पार पाडायची. कोणीही व्यक्ती दामाजीपंतांच्या घरातून विन्मुख जात नसे. दामाजीपंत नौकरीनिमित्त परगावी गेल्यास सावित्रीबाई घरचा कारभार चांगल्या पध्द्तीने सांभाळीत असत.
इ.सन. १४५० मध्ये दुसरा अल्लाउद्दीन बादशहा राज्य करीत असता, त्याचा भाऊ, राजपुत्र, अहमदशा याने स्वतंत्र होण्याच्या इच्छेने सैन्य जमवून सोलापूर व त्याच्या आसपासचे किल्ले घेतले. तेंव्हा त्याचे परिपत्य करण्याकरिता बादशहा अल्लाउद्दिनने सैन्य पाठविले. त्यामध्ये दामाजीपंतांना तहसिलदाराचे अधिकार देऊन व सैन्यातही नायबसुभेदाराचे अधिकार देऊन सैन्याबरोबर पाठवले. या सैन्याने अहमदशा याचा पराभव करून त्यास रायचूर कडे पिटाळून लावले, व सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, कासेगांव वगैरे सर्व मुलूख पुन्हा अल्लाउद्दीन बादशहाच्या अधिपत्याखाली आला. व दामाजीपंतांची नेमणूक मंगळवेढे ठाण्यास सुभेदार व तहसिलदार म्हणून झाली. दामाजीपंत सावित्रीबाईसह मंगळवेढ्यास येऊन बहामनी राज्याचा प्रतिनिधी म्हणून काम पाहू लागले.
पंढरपूर हे त्याकाळी तीर्थक्षेत्र म्हणून फारसे प्रसिध्दीस आलेले नव्हते. दामाजीपंत तहसिलदार म्हणून मंगळ्वेढ्यास आल्यापासून दर एकादशीस सपत्नीक जाऊन, चंद्र्भागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेत असत. एवढेच नव्हे तर विठठलाचे दर्शन घेण्यासाठी ते पंढरपूरला वारंवार जात असत. पंढरपूरास वारीकरिता मंगळवेढ्याहून वारकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर जाऊ लागली. स्वत: श्री दामाजीपंतानी पांडूरंगाच्या भक्तीकरिता लोकांना प्रोत्साहन दिल्यामुळे, मंगळवेढ्यामध्ये भजनी मंडळी व वारकरी संप्रदाय यांचा फार मोठा प्रसार झाला. मंगळवेढ्याचा दामाजीपंतांचा वाडा हे वारकरी लोकांचे आश्रयस्थान झाले. व पंढरीस जाणारे दिंड्या, भजनी मंडळी मंगळवेढ्यास राहून दामाजीपंतांचे दर्शन घेऊन पंढरपूरास जाऊ लागले. दामाजीपंताचीही दिवसेंदिवस संत म्हणून ख्याती वाढू लागली.
दामाजीपंत तहसिलदार झाल्यापासून मंगळवेढ्याचा कारभार सुधारला. लोक सुखी व आनंदी झाले. परचक्राची भीती नाहीशी झाली. बहामनी राज्य जरी असले तरी, बिदरपासून दूर असल्याने मुसलमानांपासून होणारा उपद्र्व कमी झाला व दामाजीपंतांच्या कारभारामुळे प्रजा सुखी व संतुष्ट झाली. तिकडे बिदरला दुसरा अल्लाउद्दिन बादशहा मयत झाला. व जालीम हुमायूनशहा या बादशहाचा जहरी अंमल सुरु झाला.
बिदरचा बादशहा हुमायूनशहा इ. सन. १४५८ साली गादीवर आला व बिदरला जूलमी राजवट सुरु झाली. हा राजा इतका क्रुर, विषयलंपट व राक्षसी स्वभावाचा होता की फेरिस्तासारख्या इतिहासकारानेही त्याला जालीम ही उपाधी दिली. या बादशहाने आपल्या भावास क्रुर भूकेल्या वाघाच्या तोंडी देऊन मारविले. आपल्याविरुध्द कोणी बोलत असल्याचा जरी नुसता संशय आला, तरी तो त्याचा शिरच्छेद करण्यास मागेपुढे पाहत नसे. हजारो लोकांनां किल्ल्यात आणून हालहाल करून मारले जात असे.
अशा या क्रुर राजेशाहीत बिदरपासून १२० ते १३० मैल लांब असलेल्या मंगळवेढ्याला दामाजीपंत तहसिलदार म्हणून सन १४५८ ते १४६० पर्यंत काम करीत होते आणि याच वेळेस दामाजीचा दुष्काळ म्हणून प्रसिध्द असलेला दोन वर्षाचा दुष्काळ मंगळवेढ्याच्या आसपास पडला होता.
दामाजीपंतांचा दुष्काळ
इ.सन १४५८ उजाडले, व पावसाने अशी काय दडी मारली की तब्बल दोन वर्षे पाऊस बिलकुलही पडला नाही.
मंगळवेढयाच्या आसपासचा सर्व मुलूख दुष्काळाच्या खाईत लोटला गेला. पंढरपूर, सोलापूर, सांगोला, विजापूर या सर्व भागातील लोक भूकेने मरू लागली. त्यावेळी दळणवळणाची साधने फारशी नव्हती. रस्ते नव्हते. जवळपासच्या कोणत्या मुलखांत सुबत्त आहे याची माहीती जनतेस कळत नव्हती. त्यामुळे स्थलांतर करून अथवा परठिकाणांहून माल आणून दुष्काळग्रस्त लोकांना पुरविण्याची सोय नव्हती. धान्य महाग झाले, तरीपण धान्य मिळेना. लोक पैसा व दागिने घेऊन अन्नासाठी हिंडू लागले. त्यातच गांवातील विहीरी व तळी आटू लागली. गुरांनां पिण्यास पाणी व खाण्यास वैरण मिळेना. लोकांनी प्राणांपेक्षा प्रिय असलेली गुरें मोकळी सोडून दिली. गुरांना बाजारातही कोण विकत घेईना. घरातले धान्य संपले म्हणून लोक भीक मागू लागली. कोणी भिक घालेना, म्हणून लोक रस्त्यावरच उपाशी पोटी पडू लागली. तरूण लोकांपेक्षा, वृध्द व लहान मुलांचे हाल बघवेनासे झाले. पंढरपूरला ही लोकांचे या दुष्काळामुळे हाल झाले. चंद्र्भागा गोठली, तीत लोकानी पाण्यासाठी झरे काढले.
त्यावर्षी मंगळवेढ्याला मात्र चमत्कारस्वरूप जो काही थोडाफार पाऊस पडला होता, त्यावर या ठिकाणी पिके आली होती. सरकारी वसून धान्यरुपाने झाला होता आणि ६०० खंड्याची गंगा व जमुना ही दोन मोठी कोठारे ज्वारीने भरलेली होती. मंगळवेढ्यातील लोकांच्या घरीही पुरेल एवढे धान्य होते. दामाजीपंताच्या आश्रया खाली लोक सुखी होते.
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥
ही कृती प्रत्यक्ष दामाजीपंत व मंगळवेढ्याचे लोक आपल्या कार्यातून दाखवत होते. परगावचा कोणीही पांथस्थ गांवी आला की तो उपाशी पोटी परत जात नसे. मंगळवेढे येथे गेल्यास पोटभर खावायास मिळते ही बातमी वणव्यासारखी चोहोकडे पसरली. एक वेळचे जेवण मिळावे म्हणून बारा-बारा मैल चालत लोक मंगळवेढ्याला येऊ लागले. लोक १०० ते २०० च्या जमावाने येऊ लागले. सगळीकडॆ हाहाकार माजला. लोकांना भुकेपोटी अन्न व पाण्याशिवाय दुसरे काहीच प्रिय राहीले नाही. वर्ष संपत आले तरी दुष्काळाच कहर अजून सुरुच होता. मंगळवेढ्यातील लोकांच्या घरातील धान्य कमी होऊ लागली..परिणामस्वरुप मदत म्हणून भुकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी त्यांचे हात आता आखडू लागले. १४६०चा पावसाळा लागला खरा, पण पाऊस कुठे आहे? हे वर्ष पण गेल्यावर्षासारखे दुष्काळातच जाते की काय याची भीती आता लोकांना वाटू लागली. आणि नेमके तसेच झाले, सर्व नक्षत्रे पावसाशिवाय गेली...पुन्हा एकदा दुष्काळ..
आता मंगळवेढे गावचे लोकांचेपण धान्य संपले. लोक दामाजीपंतांच्या वाड्यासमोर जाऊन धरणे धरुन बसली. दामाजीपंताची पत्नी सावित्रीबाईनी वेळ ओळखून आपल्या वाड्यात धान्य साठवून ठेवले होते. वाड्यावर आलेला, भुकेने व्याकूळ झालेले लोक, पंगतीने जेवण करुन जात असत. पण वाड्यावरचे ते धान्य पण किती वेळ या लोकांची भूक भागवणार. ते ही धान्य संपले. पण दामाजीपंताच्या वाड्यासमोरील भुकेल्या लोकांची गर्दी काही हटेना
कोठारात धान्य आहे पण..?
दामाजीपंतांनी बिदरास दुष्काळाची हकीकत कळविली. पण जालीम हुमायूनशहापर्यंत ही हकिकत कोण सांगणार? चैनीत, जनानखान्यातील ऎश आरामात बादशहा दंग होता. महमद गवाण सारखा हुशार दिवाण होता. पण तो या जालीम बादशहापूढे काय करणार? अनियंत्रित राजसत्ता म्हणजे किती कठोर व लहरी! प्रजा दुष्काळामुळे मरू लागली तरी बादशहास त्याचे काय? त्याची चैन चाललीच होती. दामाजीपंतांनी एक नाही दोन सांडणीस्वार पाठवले. दरबाराकडून मदत मागविली पण उत्तर नाही. शेवटी मंगळवेढ्याच्या कोठारातील धान्य दुष्काळग्रस्तांना विकत देण्याची परवानगी मागितली, पण त्याचेही काहीही उत्तर नाही. त्याकाळी बिदरहून मंगळवेढ्यास पत्र येण्यास आठ ते पंधरा दिवसही लागत. पण गरिबांनां, उपाशी लोकांना हे सर्व काय माहित? ते दामाजीपंतांनाच गरीबांचा वाली, कनवाळू समजायचे, आणि त्यांच्या वाड्यापूढे याचना करत असत. त्यातच इतरच्या परिसरातील, पंढरपूरातील लोकांनी, दामाजीपंताकडे गेले की जेवण मिळते, धान्य मिळते हे समजल्याने, आसपासचे लोकही मंगळवेढ्याकडॆ धान्यासाठी येऊ लागली. अनेक लोक या भयान दुष्काळाने मृत्युमुखी पडले
दामाजीपंत व त्यांची पत्नी, सावित्रीबाई, हे दृश्य पाहून भयभीत झाले. घरातील धान्य, पैसा वगैरे सर्व काही संपले होते. या सर्व लोकांना काही नाही म्हणून सांगायचे त्यांच्या जीवावर आले. दामाजीपंतांच्या डोळ्यासमोर धान्याची कोठारे दिसू लागली. दामाजीपंत विठठलाची आळवणी करू लागले. पंढरपूरकडॆ तोंड करून हात जोडून ते बसले व म्हणाले--- "बा..परमेश्वरा, बिदरहून कोठारातील धान्य फुकट देण्याची नाही का होईना, पण विकत देण्याची तरी लवकर परवानगी येऊ दे." दामाजीपंत नामस्मरण करत ध्यानस्थ बसले. बराच वेळ गेला. लोकांची आरडाओरड, रडारड अधिकच वाढली. कुठला स्वयंपाक आणि कुठले जेवण? सारे लोक दामाजीपंतापुढे उपाशीपोटी, उदास चेहरा करून बसले होते.
दामाजीपंतांनीही सकाळपासून तोंडात पाणीही घातले नव्हते. घरातून त्यांची पत्नी सावित्रीबाई बाहेर आली.
सावित्रीबाई -- "(दामाजीपंतांस) आता उठावे घरात तरी चलावे.
दामाजीपंत --" काय करू घरात येऊन? माझा हा जनताजनार्धन परमेश्वर उन्हातान्हात उपाशी बसला आहे."
सावित्रीबाई --- " मग आता या लोकांनां काय द्यावयाचे?"
दामाजीपंत --- " आता सरकारी धान्य कोठाराशिवाय काही नाही. पण अजून बादशहाकडून हे धान्य विकण्याची परवानगी आली नाही. काय करावे?"
सावित्रीबाई --- " परवानगी मागाहून येईल, तोपर्यंत या लोकांना धान्य दिले तर लोक तरी वाचतील.
दामाजीपंत --- "परवानगी शिवाय धान्य दिले म्हणून बादशहाला माझा राग येईल. मला शिक्षा म्हणून तोफेच्या तोंडी अथवा फाशी जावे लागेल. तुला बादशहा किती क्रुर आहे, माहीत आहे ना? मी फाशी गेलो तर तुला चालेल काय?"
सावित्रीबाई--- "असे अभद्र काय बोलता हो? कुठल्या बायकोस आपला नवरा फाशी जावा असे वाटेल !"
दामाजीपंत --- "हजारो लोकांचे प्राण वाचवण्याकरिता माझा एक जीव जात असेल तर हजारो जीवांकडे पाहायचे की स्वत:च्या प्राणाकडे पाहायचे? तुला नवरा प्रिय आहे हे खरे, पण हा जनताजनार्धन परमेश्वर नव-याहून प्रिय नाही का?"
सावित्रीबाई -- " मला असे पेचात पाडू नका. मला तुम्ही पाहिजे आणि जनताजनार्धन परमेश्वरही पाहिजे. तुम्हीच माझे परमेश्वर आहात, तुम्हास सोडून मी कशी राहीन?"
दामाजीपंत ---" हे बघ वेळ कठिन आहे. मायामोह यावेळी आवरला पाहिजे. जगाच्या कल्याणाकरिता स्वत:च्या घरादारावर निखारा
ठेवण्याची पाळी आली तरी माणसाने स्वत:च्या घराचे बलिदान जगाच्या कल्याणाकरिता केले पाहिजे. पहा---पहा....,
डोळे मिटून, चिंतन करून, जनताजनार्धनाला. पंढरीच्या विठ्ठलाचे रुप आठव. मला तर यावेळी या पेवातील धान्य
गरीब भुकेल्या जनतेला फुकट वाटावे असे वाटते. ते पैसा कुठला देणार? माझा एकट्याचा जीव हजारो जीवांपेक्षा
मोठा आहे काय?"
सावित्रीबाई --- " नाथ, आपण एकटेच का? मीही तुमच्याबरोबर फाशी अथवा तोफेच्या तोंडी जाण्यास तयार आहे. पण परमेश्वर
आपला पाठिराखा आहे. तो भक्तांना अशा संकटातून रक्षितो, असा माझा विश्वास आहे."
या प्रमाणे दामाजीपंतांचे आणि सावित्रीबाईचे बोलणे चालू असता, बाहेर जमलेल्या लोकांमध्ये जास्तच आरडाओरड व गोंधळ माजला. खूप वेळ झाला तरी पंतांच्या वाड्यासमोर बसूनही काही मिळॆना. दामाजीपंतांच्या नावे हाका मारून लोक जास्तच गयावया करु लागले.
बिदरहून सरकारी पेवातील धान्य देण्याचा हूकूम येईना. तेव्हा दामाजीपंतांनी तहसील कचेरीतील हाताखालच्या सर्व नोकरांना बोलावले व विचारविनिमय केला. पण जालीम हुमायूनशहा बादशहाचे क्रुरपणाचा व जुलमी राजवटीचा वचक सर्वांना असल्यामुळॆ कोणीच दामाजीपंतांना सरकारी कोठारातील धान्य या गरीब जनतेला द्यावे, असा सल्ल देईना. दामाजीपंत पुन्हा अस्वस्थ झाले. काय करावे त्यांना सुचेना. आपल्या वाड्यातील देवघरात जाऊन देवापुढे ध्यान लावून ते बसले. बराच वेळ झाला, दामाजीपंत देवघरातून बाहेर येईनात. वाड्यातील सदरेवार जमलेले लोक दुष्काळ पिडितांचे हाल पाहून अस्वस्थ झाले. इतक्यात देवघरातून दामाजीपंत गंभीर मुद्रा घेऊन बाहेर आले, आणि अंगरखा आणि पगडी घालून तहसिल कचेरीत निघाले. धान्य कोठाराच्या रक्षकांनां व अधिका-यांना त्यांनी बोलावणे पाठवले. त्यांच्या मागून घरापूढे जमलेले गरीब, भूकेने व्याकूळ झालेले लोक पण निघाले. तहसिल कचेरीत येताच दामाजीपंत सर्वांपूढे हात जोडून उभा राहीले, त्यांच्या मुखावर सात्विक तेज दिसत होते. मनात काहीतरी निश्चय केल्याचे दिसत होते. ते सर्वांना म्हणाले---- " इतका वेळ बादशहाची परवानगी येईल, म्हणून मी वाट पाहिली पण परवानगी आली नाही, व तुमचे हाल ही मला पाहवत नाही. म्हणून तुम्ही या कोठारातील थोडॆ थोडे धान्य घेऊन जावे व आपले जीव जगवावे". एवढे बोलून श्री दामाजीपंतांनी कोठाराची कुलपे काढण्यास रक्षकास सांगितले व पेवातील धान्य जितके पाहिजे तेवढे नेण्यास सांगितले. लोक आनंदून गेले. पेवाच्या दारात लोकांच्या रांगाच्या रांगा लागल्या. ते दामाजीपंतांना व सावित्रीबाईंना आशिर्वाद देऊन धन्य धन्य तुझी दामाजीपंता असे म्हणून जात असत. हे कोठार लुटण्याचे काम आठ दिवस चालले होते. दामाजीपंतांच्या या कृत्याची चहूकडे वाहवा झाली. दामाजीपंत व सावित्रीबाई, दोघेही शांत चित्ताने राहीली, बादशहा कुठलीही शिक्षा देऊ, ते सोसण्याची तयारी त्या दोघांनी केली होती.
दामाजीपंतांस अटक
या जगामध्ये सज्जन थोडे आणि दुर्जन फार आहेत. चांगल्या कार्याची वाहवा दुर्जनांनां बघवत नाही. मंगळवेढ्यातही दामाजीपंतांच्या कचेरीत काही दुर्जन होतेच. त्यामध्ये मुजुमदार म्हणून एक प्रसिध्द होते. स्वत:च्या हातून तर एकही चांगले कृत्य कधी व्हायचे नाही, पण दुस-याने चांगले कृत्य केलेले बघवत ही नाही. मुजुमदारांना तहसिलदाराची जागा मिळवायची होती. दामाजीपंताबद्दल दरबारात चुगली केली व बादशहाचा दामाजीपंतावर रोष आला म्हणजे आपणास तहसिलदाराची जागा मिळेल, असे त्यास वाटत होते. त्याने बादशहास गुप्तपणॆ पत्र लिहून, ’दामाजीपंतांनी सरकारच्या परवानगीशिवाय सर्व धान्य लोकाना देऊन सरकारची नुकसानी केली आहे’ असे कळविले. आणि दामाजीपंत हे दरबाराविरुध्द वागतात हे ही कळविले.
बादशहा हुमायूनशहा अगोदरच जालीम म्हणून प्रसिध्द आणि त्यात चुगलीची भर. बादशहा क्रोधित झाला. आणि एकदा बादशहाला राग आला कि त्यापुढे महमद गवान सारखा हुशार असलेला दिवान, जायला धजत नसे. बादशहाने ताबडतोब दामाजीपंतांना पकडून आणण्याचा आणि कृष्णाजीपंत मुजुमदार यांना तहसिलदार म्हणून नेमण्याचा हुकूम पाठविला. ताबडतोब चार पठाण घोडेस्वार, एक त्यांचा अधिकारी असे मंगळवेढ्यास निघाले व घोडदोड करीत तीन दिवसात मंगळवेढे तहसिल कचेरीत हजर झाले. जालीम हुमायूनशहा यांने कोणास भेटीस बोलावणे पाठवले की म्हणजे तो पुन्हा परत येत नाही, असा त्यावेळी लोकांनां अनूभव होता. म्हणून भेटीस बोलावणे, जाण्यापूर्वी आपल्या बायका मुलांचां निरोप घेऊनच जात असत. आणि येथे तर दामाजीपंतांना पकडून आणण्याचा हूकूम होता. दामाजीपंत कचेरीत काम करीत होते. त्यांनी तो हूकूम पाहून काय समजायचे ते समजले. कचेरीतील सर्वांचा निरोप घेऊन ते घरी सौ. सावित्रीबाई यांचा निरोप घेण्यास निघाले. हा हा म्हणता ही बातमी मंगळवेढे गावात सर्वांना कळाली. सर्व लोक गंभीर चेहरे करून दामाजीपंतांच्या वाड्यासमोर उभी राहीली. ही बातमी ऎकून सावित्रीबाईला रडू कोसळले. आपण ही दामाजीपंताबरोबर बिदरला जावे असे सावित्रीबाईंना वाटले. पण यावर " अगं, आता या वेळेस बिदरला तू कशाला येतेस, मी जाऊन आल्यावर पुन्हा एकद जाऊं." असे दामाजीपंत म्हणाले.
असे बोलणे चालू असताना, तोच पठाण घोडेस्वार वाड्याबाहेर आले, "अजून तयारी झाली नाही का? लवकर चला. नाहीतर बेड्या ठोकून नेऊ" असे म्हणू लागले. सावित्रीबाई वाड्याबाहेर आल्या व पठाण स्वारांना म्हणाल्या " दामाजीपंत जेवण करीत आहेत. आपणही त्यांचेबरोबर जाणार आहात, तुम्हीही थोडॆ जेवून घ्या." "नाही...होय" म्हणत पठाण घोडॆस्वारांनीही जेवण केले व सर्वांची निघण्याची सिध्दता झाली. दामाजीपंत तहसिलदारासारख्या नोकरीवरील अधिकारी व लढाईतही वाकबगार. पण वाड्याबाहेर येताच "दामाजीपंतांना बेड्या ठोकून व दंडास मुसक्या बांधून आणण्याचा बादशहाचा हुकूम आहे" असे सांगून पठाण घोडेस्वारांनी दामाजीपंतास मुसक्या बांधून घोड्यावर बसून चालण्यास सांगितले. सावित्रीबाईने हे पाहून हंबरडा फोडला व दामाजीपंत आता परत येत नाहीत हे तिला कळून चुकले. आता पुन्हा दामाजीपंत दिसणार नाहीत असे समजून तिने आकांत करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून सर्व लोक ही हळहळू लागले. कोठारे लुटली म्हणून पंतास धरून घेऊन जात आहेत, ही कल्पना सर्वांना आली. व याची शिक्षा सुध्दा त्यांच्या डोळ्यासमोर आली. सावित्रीबाईनी तरी आता बिदरास बरोबर जाण्याचा हट्टच धरला. दामाजीपंताचे अंत: करण सुध्दा हे दृश्य पाहून हेलावले. सावित्रीबाईची कशी समजूत काढावी, याची पंचाईत त्यांन पडली. संकट काय आहे हे पंतांना कळून चुकले होते, आणि यातच आपण धीर सोडला तर इतरांची काय कथा? म्हणून त्यांनी धीर-गंभीर वृत्ती धारण केली, मनाचा निश्चय केला व ते लोकांना म्हणाले...
"प्रिय नागरिकहो, असे हताश काय होता. मी काय पाप केले नाही अथवा गुन्हा केला नाही. भुकेलेल्या मंडळीना धान्य वाटले आहे. माझा यात स्वार्थ काय होता? परमेश्वराच्या ठिकाणी हा गुन्हा होणार नाही. बादशहाने जरी मला शासन केले तरी पंढरीचा पांडूरंग जो भक्तांचे रक्षण करण्य़ास सदा सिध्द असतो, तो, माझेही रक्षण करील. तुम्ही स्वस्थ चित्ताने घरी जा आणि परमेश्वरचिंतन करा."
सावित्रीबाईजवळ जाऊन दामाजीपंत पुन्हा तिचे सांत्वन करु लागले. पंढरीची वारी ते करीत असत ती न चुकता तिला करण्यास सांगून ’आपण निश्चित परत येऊ, काळजी करू नकोस, परमेश्वरावर विश्वास ठेव’ असे तिला पुन्हा पुन्हा सांगितले. इतक्यात पठाणांनी निघण्याचा इशार दिला. दामाजीपंत मुसक्या बांधलेल्या स्थितीत घोड्यावर स्वार झाले, चार घोडेस्वारांच्या मध्ये त्यांचा घोडा चालू लागला. सावित्रीबाई, पंतांच्या सागण्या प्रमाणे वाड्याच्या दारात उभे राहून, दामाजी जात असलेल्या वाटेकडे तोंड करून उभ्या राहिल्या. बाकी जनता दामाजीपंतांच्या मागे धावत रडत माणनदीपर्यंत आली. दामाजीपंताना नेऊ नका असे ते वारंवार घोडेस्वारांना विनवित होते. पण ती आशा ही मावळली. दामाजीपंतांनी पुन्हा एकदा लोकांना विनंती केली आणि घरी परत जाण्यास सांगितले. जनता व्यथित अंतकरणाने मागे फिरली व दामाजीपंताची स्वारी पंढरपूर च्या दिशॆने चालू लागली. मार्ग चालू असताना दामाजीपंत आत्मिक तळमळीने भक्त वत्सल्य पांडूरंगाचे मनोमन चिंतन करीत होते.
झाला महार पंढरीनाथ
दामाजीपंतांना तर आता अटक झाली. पण आपल्या भक्ताला बादशहापासून सोडविण्यासाठी खुद्द पंढरपूरचा पांडूरग गेला. तो ही विठू महाराच्या वेशभूषेत. ती कथा अशी आहे..............
दामाजीपंतांच्या मामलेदार कचेरीत विठू नावांचा एक महार अतिशय प्रामाणिक नोकर होता. त्याकाळी महसूल महाराकरवी राज दरबारी भरण्याची पध्दत होती. आणि हिच युक्ती पंढरीच्या पांडूरंगाने लडविली. डोकीवर फाटकं मुंडास, मलीन फाटके धोतर, खांद्यावर घोंगडी, पायात वहाणा, व हातात घुंगराची काठी आणि कपाळावर गंधाचा टिळा, असे हे पांडूरंगाचे रुप.
बिदरमध्ये पांडूरंग, विठू महाराच्या रुपात गेले असता, असे म्हंटले जाते की, त्यांनी एक पाऊल बिदरच्या वेशीत तर दुसरे पाऊल चक्क बादशहाच्या दरबारात ठेवले. अचानक प्रकट झालेल्या विठूला पाहून बादशहाच्या वजीराने, आपण कोण? कुठून आलात? आत यायला आपणास कोणी अडवले नाही का? असे प्रश्न केले.
त्यावर विठू महार नम्रतेच्या सुरात व धीर गंभीर होऊन म्हणाले, " मी मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांचा प्रामाणिक नोकर आहे. मला विठू महार म्हणतात. माझ्या धन्यास (दामाजीपंत) दुष्काळाने झालेले जनतेचे हाल पाहावेनात, म्हणून हुजूर त्यांनी आपल्या ताब्यातील धान्यांनी भरलेली कोठारातील धान्य विकून, असाहाय्य जनतेचे प्राण वाचविले. त्या मोबदल्यात पैशाचा भरणा करण्यासाठी दामाजीपंतांनी मला पाठवले आहे. असे म्हणून विठू महाराने (पांडूरंगाने) कमरेची थैली काढून बादशहाच्या दरबारात अमीर उमराव यांचे समोर उघडी केली तेंव्हा त्यातून खळखळ असा आवाज होत मोहरांचा प्रचंड ढिग लागला. एवढ्या लहानशा पिशवीतून एवढा मोठा मोहरांचा ढिग पाहून बादशहा आ वासून बघत राहिला. अमीर उमराव व दरबारातील सर्व जनता एकमेकांकडे डोळे वासून आश्चर्याने पाहू लागली. लोकांना कळण्याच्या आत पांडूरंगाने पैशाचा भरणा केल्याची पावती मागितली. आणि पावती मिळताच पांडूरंग दरबारातून अदृश्य झाले, ते थेट दामाजीपंत बिदरच्या वाटेवर ज्या ठिकाणी मुक्कामी होते, आणि तेथेच अदृश्य रुपात ती पावती गीतेच्या ग्रंथात ठेऊन पंढरपूरला गेले.
विठू महाराच्या वेशभूषेत, पंढरीच्या पांडूरंगाने बिदरच्या वेशीत ठेवलेले पहिले उजवे पाऊल, तेथे उमटले व ते अजून ही जवळ जवळ ८०० वर्षांनंतर तसेच आहेत. या पाऊलाची रोज सकाळी पूजा केली जाते. दुसरे पाऊल दरबाराच्या घुमट वेशीपाशी आहे तेथे ही ते उमटले आहे व त्याची पण रोज सकाळी पूजा केली जाते. मुसलमानी राजवटीपासून ही पावले तेथे आहेत. असे म्हंटले जाते की ही पावले नष्ट करण्याचा प्रयत्न ब-याच वेळेला केला, पण त्यात यश आले नाही, असे बिदर मधील नागरिक सांगतात.

श्री पांडूरंगाचे बिदरच्या वेशीतील उमटलेले पाऊल
मंगळवेढा किल्ल्याच वर्णन
एसटी आगार पासून ५ ते १० मिनटात चालत मी किल्ल्याजवळ पोहचलो. रस्त्याला एक तांदळा स्वरूपातील कुठच्या तरी देवाचं मंदिर लागलं त्यात एका पाषाणावर नागाची कोरीव शिल्प होता. ते बघून पुन्हा पुढे चाललो. तेथून ५ मिनटात मी किल्ल्याचा ४ बुरुज आणि ४ भिंतच्या गडी जवळ पोहचलो. आता ते उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. त्यात काही मूर्ती आहेत पण पोलीस फोटो काडून देत नाही कारण त्याचा पाठी कारागृह आहे. मला स्वतः अनुभव आला तरी एका पोलिसाने फोटो काढून दिले म्हणून बर झालं. आत अजून पाहण्यासारखं काही नाही.
तेथून बाहेर पडून मी त्या गडीच्या चारी बाजूने फिरलो. गडीच्या बाजूला एक मंदिर आहे त्याचा बाहेर हि काही मूर्ती आणि शिवपिंड आहे. गडीच्या पाठी डाव्या बाजूला काशीविश्वेशरचा प्राचीन मंदिर आहे. तिथे हि अजून काही मूर्त्ती मंदिराचा आवारात दिसतात. तर त्याचा बाजूलाच लागून पायरायची विहीर आहे. ती आता दुरावस्थेत आहे आणि त्याचा एका कोपऱ्यात ब्रह्माची ३ ते ४ फूट उंचीची मूर्ती आहे. मी तिथे जाण्याचा प्रयत्न केला पण दगडी घसरून पडण्याचा भीतीने लांबून फोटो काढला.
श्री संत दामाजी महाविद्यालय येथील संग्रहालय
ते बघून मी "श्री संत दामाजी महाविद्यालय" कडे निघालो. कारण तेथे अनेक प्राचीन मूर्तीचा उघड्यावर संग्रहालय केला आहे. त्याचा मी फोटो खाली लावला आहे. मंगळवेढा ते महाविद्यालय अंतर १.५ किमी आहे. गडीचा जवळ पास एका दुकानदाराला विचारलं त्यांनी मला त्या महाविद्यालयचा नाव सांगितलं आणि जवळच आहे सांगितलं. म्हणून मी गडीपासून सरळ मारवाडी गल्लीतून चालू लागलो. थोड्या वेळाने मी गुगल नकाशावर बघितला अजून १ किमी आहे. चालत चालत मी मारवाडी गल्ली जेथे बोराळेनाका रोडच्या गल्लीला भेटते तिथं पर्यंत चालत आलो. त्या दोन्ही गल्ली एकमेकांना जेथे भेटतात. त्याचा २ मिनटं आधी मारवाडी गल्लीत रस्त्यात डावीकडे एक नवीन मंदिर आहे. त्याचा समोर म्हणजेच आपल्या उजवीकडे एक जुन/ प्राचीन लहान मंदिर/ घरासारखी वास्तू दिसते. तिथे त्या वास्तूच्या बाहेर काही प्राचीन मूर्ती दिसतात आणि एक मूर्ती आणि विरगळ भग्न अवस्थेत वडाचा झाडाखाली आहे. त्यांचे मी फोटो खाली दाखवले आहे. तसेच हि जागा कुठे आहे मी त्याचा नकाशाचा फोटो हि लावला आहे. ज्याने करून तुम्हाला कळेल. सांगायचं तात्पर्य माझ्या मते बहुतेक लोकांना कदाचित हे माहित नसावं. आणि हि जी प्राचीन जागा आहे. त्याचा पाठी सांगोल्याला जाणारा रस्ता लागतो. तो पुढे २ मिनिटावर बोराळे नाक्याला मिळतो. तेथून तुम्ही सोलापूरला जाणाऱ्या रस्त्याने गेलात कि ७०० मीटर वर महाविद्यालय आहे.महाविद्यालयाचा बाहेरील फोटो आणि पिवळ्या रंगाचा वर्तुळ मध्ये संग्रालयाची जागा दर्शवली आहे
![]() | |||||||
![]() |
| श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा येथील संग्रालय |
पण मी पुन्हा त्या गल्लीत येऊन बोराळे नाक्याचा दिशेने चालू लागलो. तेथे मला एक मोटारसायकल वर जाणारा मुलगा भेटला तो हि तिथेच चालला होता. त्याला, मला महाविद्यालय जवळ सोडायला सांगितलं. त्यामुळे मी दोन मिनटात तेथे पोहचलो. महाविद्यालयाचा दरवाजाने आत पायऱ्या चडून आल्यावर एक मोठं मैदान लागते. तेथे डाव्याबाजूला उघड्यावर मुर्ती ठेवल्या आहेत.
मंगळवेढा
प्रकार : भुईकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
भीमा नदीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा संतभूमी म्हणून ओळखली जाते. संत
चोखामेळा, संत दामाजी आणि कान्हापोत्रा यांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव
पावन झालेले आहे. सोलापूर-सांगली रस्त्यावर सोलापूर पासून ५० कि.मी.अंतरावर
मंगळवेढा हे ठिकाण आहे. विजापूरजवळ असल्याने हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात
महत्वाचे होते. आदिलशहाची राजधानी विजापूर व निजामशाहीची राजधानी नगर या
दोन्ही शाह्यांच्या आपापसातील लढाईत मध्यभागी असलेले मंगळवेढा सतत बेचिराख
झाले. मंगळवेढा गावात किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले असुन कोरीव स्तंभ,
भग्न मूर्ती, शिलालेख यांचे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले
पाहण्यास मिळतात. किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी आता असलेल्या दरवाजासमोर
काही अंतरावर एक सफेद रंगाची जुम्मा मशीद दिसुन येते. मंगळवेढे गावापासून
जवळच माचणूर याठिकाणी इ.स. १६९५ ते १७०२ औरंगजेबाचा मुक्काम असताना औरंगजेब
मंगळवेढे येथील या जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असे.
कै.रा.ग.करंदीकर यांच्या १९६०मध्ये छापलेल्या श्री.संत दामाजी महाराज यांचे
चरित्र या पुस्तकात मंगळवेढा किल्ल्याचे वर्णन खालीलप्रमाणे आले आहे.
औरंगजेबचा मुक्काम मंगळवेढ्यापासून नऊ मैलावर माचनुर येथे असता त्याच काळात
मंगळवेढा कसब्याभोवती इ.स.१६९४ साली गावकूस बांधले गेले. त्याची एकंदर
लांबी ६९३६ फूट व रूंदी ८ फूट होती. त्याच्या पुर्वेस बोराळे,नेऋत्येस
सांगोला,व उत्तरेस कासेगाव अशा तीन वेशी होत्या. या वेशीमध्ये १२ फूट उंच व
१४ फूट व्यासाचे चौदा बुरुज होते. १५ व्या शतकात मंगळवेढ्यात अनेक जैन
मंदिर होती. ती मंदिरं उद्ध्वस्त करून त्याच्या अवशेषांचा वापर करून
बिदरच्या मुसलमानी राज्यकर्त्यांनी सात बुरुजांचा आतील भुईकोट किल्ला इ.स.
१४९३साली बांधला. त्याची लांबी उत्तर दक्षिण अंगास १२४५ फूट, पूर्व अंगास
१२०० फूट व पश्चिम अंगास ९२० फूट आहे. तट १३ फूट रुंदीचा व ३५ फूट उंचीचा
होता. त्यात असलेल्या सात बुरुजांची नावे अनुक्रमे मर्दान, करड, चौफाळा,
जगभावी, गच्ची,कैकाड आणि बोराळ अशी होती. यातील सर्वात मोठया मर्दान
बुरुजाची उंची ५७ फूट व व्यास ५० फूट होता व तो लक्ष्मीनारायण देवळासमोर
होता. किल्ल्याभॊवती खंदक ८२ फूट रुंद होता. पुर्वेस मुख्य वेस असून ती १४
फूट उंच व १२ फूट रूंद होती. इ.स. १७०० नंतर मोगल अंमल संपून हा किल्ला
मराठ्यांच्या ताब्यात आला. छत्रपती शाहू महाराज यांनी राजे पांढरे यांना
प्रमूख नेमले. इ.स. १७०८ ते १७४२ पर्यंत त्यांचा अंमल असताना त्यानी सध्या
उभी असलेली चौबुर्जी इ.स. १७२० ते १७३० पर्यंत बांधली. ही चौबुर्जी मुख्य
किल्ल्यातील आतील बालेकिल्ला आहे. तो चौकोनी असून प्रत्येक बाजूची लांबी
२३० फूट आहे. भिंत १८ फूट उंच असून ८ फूट रूंद आहे. त्यास रणमंडळ रहाट, भूत
व बडेखान असे चार बुरुज असून ते २५ फूट उंच व ३० फूट व्यासाचे आहेत. तटाचे
रणमंडळ बुरुजावर तास वाजवित असत म्हणून त्या बुरुजास तास बुरुज असे म्हणू
लागले. सध्या करंदीकर वकील राहतात त्यांच्या घराजवळील हा रणमंडळ बुरुज होय.
वरील वर्णन पहाता किल्ल्याला एकुण तिहेरी तटबंदी असल्याचे दिसुन येते. आता
आपल्याला पहायला मिळणारी वास्तू म्हणजे मुख्य किल्ल्याच्या अंतर्गत असणारी
किल्लेवजा गढी असुन त्याला चार मातीचे बुरुज आहेत. किल्ल्याचे क्षेत्रफळ
एक एकर असुन सध्या किल्ल्यात तलाठी कचेरी, पोलीस चौकी आणि उपविभागीय
दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. किल्ल्यात असणाऱ्या कार्यालयामुळे
किल्ल्याचे दोन भाग पडले असुन किल्ला पहाण्यासाठी दोन वेगवेगळ्या वाटांनी
आत जावे लागते. आपण आत शिरतो तो किल्ल्याचा दरवाजा अलीकडच्या काळात
बांधलेला असुन किल्ल्याचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे जो दगडांनी चिणून
बंद केला आहे. तटबंदी व बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजूने दोन ठिकाणी
पायऱ्या आहेत. किल्ल्याचा तट आजही मजबूत असुन त्याचे दुमजली बुरुज मात्र
ढासळत चालले आहेत. यातील पुर्व बाजुंच्या बुरुजाचे बारकाईने निरीक्षण केले
असता त्यांना कधीकाळी पाकळ्यांचा आकार असल्याचे दिसुन येते. किल्ल्याच्या
भोवती असणारा खंदक पुर्णपणे नष्ट झालेला आहे. किल्ल्याच्या आत मोकळ्या
जागेत काही जैनदेवतां मूर्ती, नागशिल्पे, मंदिराचे कोरीव खांब आणि एक
विश्वेश्वराचा मुखवटा नजरेस पडतो तसेच तटबंदीच्या एका कोपऱ्यात काही
कोरलेल्या मूर्ती,सप्तमातृका व गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. किल्ल्यात
असणाऱ्या कार्यालयांमुळे आत मुक्तपणे फिरता येत नाही. मंगळवेढे शहरातील
सर्वात प्राचीन वास्तू म्हणजे किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले
काशीविश्वेश्वराचे मंदीर. कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी असता
त्यांनी या मंदिराची निर्मिती आठव्या शतकात केली. होती. ते स्वत:ला
ब्रम्हाचे वंशज मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ बांधले
असावे. मंदिरातील शिलालेखात १५७२ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा
उल्लेख आढळतो. यादवोत्तर काळात मोडकळीस आलेले हे मंदीर पुढे विजापूरच्या
गादीवर अली अदिलशाह असताना हिप्परगीचे श्री. बाहयानी धनाजी कुलकर्णी यांनी
इ.स.१५७२ साली मंदीराचा जिर्णोध्दार केला. याची हकीकत रंगशिळेच्या डावीकडील
खांबावर पाच भागात कोरली आहे. मुळ लेख ६० ओळीचा असून शालीवाहन १० वे शतकात
या मंदीराचे जिर्णोध्दार, भारद्वाज गोत्रातील धनाजी हिप्परगी यांनी केला
असा शिलालेखात उल्लेख आहे. मंदीरावर देव देवतांचे शिल्पे कोरलेली आहेत.
मंदिराच्या आवारात एक दुभंगलेली विरगळ दिसुन येते. मंदीराजवळील विहीर हि
मंदिर बांधकामावेळी बांधली असावी. काही पायऱ्या उतरल्यावर विहीरीत दिसणारी
ब्रम्हदेवाची मुर्ती हि पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मूर्तीनंतर भारतातील
दुसरी ब्रम्हदेवाची मूर्ती आहे. हि मूर्ती सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद
काळ्या पाषाणात कोरलेली आहे. याशिवाय तीर्थकर, महिषासूरमर्दिनी यांच्या
जीर्ण झालेल्या मूर्ती तेथे आढळतात. ब्रह्मदेवाच्या मुर्तीशेजारी एक भुयारी
मार्ग आहे. हा भुयारी मार्ग मंगळवेढ्याच्या पश्चिमेस कृष्ण तलावाच्या
मध्यभागी असलेल्या गोपाळ कृष्णाच्या मंदीरापर्यंत आहे असे सांगितले जाते.
गावातील महाविद्यालया जवळ प्राचीन मंदिराचे कोरीव दगड,खांब, वीरगळ पाहायला
मिळतात. संपुर्ण मंगळवेढा फिरण्यास दोन ते अडीच तास लागतात. मंगळवेढा
गावाची ऐतिहासिक परंपरा फार मोठी आहे. मंगळवेढा प्राचीनकाळी मंगलवेष्टक,
महामंडलेश्वर अशा नावांनी प्रसिद्ध होते. पूर्वीच्या शिलालेखावरून
मंगळवेढ्याचा इतिहास इ.स. ४-५ व्या शतकापर्यंत जातो. एक हजार वर्षांपूर्वी
हे गांव राजधानी असून त्यावर कल्याणीचे चालुक्य घराण्यातील सम्राटांचा अंमल
होता. इ.स. १०६० ते ११२१ पर्यंत या गांवी राष्ट्रकुटांचे उत्तराधिकारी
कलचुरी घराण्याचे राज्य होते व मंगळवेढा राजधानी होती. वीरशैव पंथाचे
संस्थापक श्री बसवेश्वर हे कलचुरी राज्याचे मुख्य प्रधान होते. म्हसवड,
तेर, अक्कलकोट येथील शिलालेखांतून कलचुरी राजसत्तेत महामंडलेश्वर राजधानी
असल्याचे उल्लेख आहेत. देवगिरीचे यादव वंशातील राजा भिल्लम याने मंगळवेढे
येथील कलचुरी घराण्याचा शेवटचा राजा बिल्हण याचा इ.स.११९१ मध्ये पराभव
केला. देवगीरीच्या यादव घराण्याचा बहामनी सुलतानाने पराभव केल्यावर
मंगळवेढे बहामनी राज्यात सामील झाले. बहामनी राज्याचे वेळीच इ.स. १४५८
मध्ये दामाजीपंत मंगळवेढ्यात महसूल अधिकारी असताना प्रचंड दुष्काळ पडला अशा
वेळी दामाजीपंतांनी सरकारी धान्य कोठारं जनतेसाठी खुली केली. त्याकरीता
बादशहाने त्यांना कैद केले असता दुसऱ्या दिवशी साक्षात पांडुरंग विठु
महाराचे रुप घेऊन दरबारी गेले आणि दान दिलेल्या धान्याइतकी रक्कम अदा करून
दामाजीपंतांची सुटका केली. नंतर मोगल सरदार बहादूर जिलाणी याने मंगळवेढे व
आसपासचा मुलूख जिंकल्याने इ.स. १४६५ ते १४७५ पर्यंत मंगळवेढे दिल्लीचे मुघल
अंमलाखाली होते. इ.स. १४९३ मध्ये मंगळवेढे येथे भुईकोट किल्ला बांधला गेला
व हे एक प्रमुख व मजबूत लष्करी ठाणे म्हणून प्रसिध्द झाले. ता. ५/११/१४९४
रोजी बिदरचा बादशहा महबूबशा यांने स्वारी करून बहादूर जिलाणीचा पराभव केला व
त्यास ठार मारून मंगळवेढे आपल्या ताब्यात घेतले. अकबराचा सरदार मीर
जयाउद्दीन मुस्ताफाखान मंगळवेढ्यास इ.स. १६०३ मध्ये रहात होता. इ.स.१६६५
साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत आदिलशाही विरुध्द
मोहिम काढली. फलटण, नाथवडा असा आदिलशाही मुलूख जिंकून मुघल सैन्याबरोबर
शिवाजीराजे १९ डिसेंबरला मंगळवेढा किल्ल्याजवळ पोहोचले. त्यावेळी विजापूरचा
सरदार सर्जाखान व नेताजी पालकर यांची या किल्ल्याकरिता लढाई झाली व
नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला. २० डिसेंबर १६६५ रोजी मिर्झाराजे
शिवाजीराजे यांनी मंगळवेढा किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली आणि तळावर परतले.
मिर्झाराजेंनी मुघलांतर्फे सरफराज खान यास किल्लेदार म्हणून नेमले. हा
किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे
मिर्झाराजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली
होती. २४ डिसेंबर १६६५ रोजी शिवाजीराजे यांची फौज विजापुरी फौजांवर चालून
गेली. उभय सैन्यात युध्द झाले पण ते निर्णायकी नव्हते. विजापुरी सेनापती
सर्जाखान याने थेट मंगळवेढा किल्ल्यावर हल्ला करून किल्लेदार सरफराज खान
याच्यासह त्याच्या पुत्रास व जावयास ठार मारले. या मोहिमेचा शेवट
होण्यापूर्वीच शिवाजीराजांनी ११ जानेवारी १६६६रोजी मिर्झाराजांच्या
परवानगीने पन्हाळ्याकडे कूच केले. यावरून १९ डिसेंबर १६६५ ते ११ जानेवारी
१६६६ या काळात शिवाजीराजे मंगळवेढा परीसरात होते. इ.स.१६६६ साली मंगळवेढे
किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. इ.स. १६८६ साली मोगलांनी आदिलशाही नष्ट
केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या
मृत्यूनंतर ते मराठयांच्या ताब्यात आले. छत्रपती शाहू महाराज यांनी
नेमलेल्या राजे पांढरे यांचा इ.स.१७०८ ते १७४२पर्यंत मंगळवेढ्यावर अंमल
होता. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाल्यावर मंगळवेढा किल्ल्याचे
महत्व कमी झाले. इ.स.१७४२ ते १७५० पर्यंत येथे पंतप्रतिनिधीचा अंमल असून
यमाजी शिवदेव हे येथे सरदार होते. नंतर गोविंद हरी पटवर्धन यांच्या
सरंजामांत हा किल्ला इ.स. १७५१ साली दिला गेला. पटवर्धनाचे मिरज व मंगळवेढे
हे दोन महत्त्वाचे किल्ले होते. इ.स.१७६३ मध्ये निजाम पंढरपूर लुटण्यास
आला असता मंगळवेढे येथील पटवर्धनांनी निजामास परत जाण्यास भाग पाडले. इ.स.
१८०८ पर्यंत मंगळवेढे हे पटवर्धन घराण्याकडे होते. इ.स. १८०८ मध्ये पटवर्धन
घराण्याच्या वाटण्या होऊन मंगळवेढे तालूका चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर
पटवर्धन यांचे वाटणीस गेला. १८१८ मध्ये मंगळवेढयाहून तीस मैलावर असलेल्या
अष्टी गावी मराठा व इंग्रज यांची शेवटची लढाई होऊन यात पेशव्याचे सेनापती
बापू गोखले हे धारातिर्थी पडले व मराठा साम्राज्य लयास गेले. चिंतामणराव
आप्पासाहेब नंतर श्रीमंत धुंडीराज तात्यासाहेब हे सांगली संस्थानाचे अधिपती
झाले. त्यांचे कारकार्दीत सांगली संस्थानाचा कारभार काही वर्षे ब्रिटीश
सरकारखाली होता. इ.स. १८७६ पर्यंत हा किल्ला मजबूत व शिल्लक होता. सांगली
संस्थानात ब्रिटीश मुखत्यारी आली असता कॅप्टन वेस्ट यांनी किल्ल्याचे
दरवाजे तर मेजर वॉलर याने तट पाडला. तटाची माती व दगड लोकांनी नेली व
खंदकही बुजवला गेला. काही बुरुज पडले काही बुरुज मुद्दाम पाडले गेले.
© Suresh Nimbalkar
मंगळवेढा (Mangalwedha) किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर
पासून ५० किमीवर सोलापूर-सांगली रस्त्यावरील मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण
आहे. चालुक्य,कलचुरी घराण्याची राजधानी काही काळ या ठिकाणी होती.
विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळीकीमुळे नेहमीच हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात
महत्वाचे होते. संत चोखामेळा, संत दामाजी या संतांच्या वास्तव्याने
मंगळवेढा गाव पावन झालेले आहे. मंगळवेढा गावात आता किल्ल्याचे फ़ारच थोडे
अवशेष उरलेले असले तरी, अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरलेले आहेत.
सोलापूरचा किल्ला, मंगळवेढा किल्ला आणि माचणूर किल्ला, सिध्देश्वर मंदिर
(माहिती साईटवर आहे) दोन दिवसात सहज पाहून होतात.
इतिहास :
प्राचीनकाळी
पुलकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसर्या मुलाचा याठिकाणी तळ होता.
त्याच्या नावावरून गावास मंगळवेढे नाव पडले असावे. आठव्या शतकात
काशीविश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्यांनी केली असे मानले जाते.
त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वत:ला
ब्रम्हाचे वंशज (पूजक) मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ
बांधले असावे. आज देऊळ नष्ट झाले असले तरी ब्रम्हदेवाची मुर्ती आजही
आपल्याला पाहायला मिळते.
आदिलशहाची राजधानी विजापूर मंगळवेढ्याच्या जवळ
आहे. इसवीसन १६६५ साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांचे सोबत
आदिलशाही विरुध्द मोहिम काढली. त्यावेळी नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला.
हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे
मिर्झा राजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली
होती. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. इसवीसन १६८५
मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उध्वस्त झालेला मंगळवेढा किल्ला ताब्यात
घेतला.
मंगळवेढे गावापासून जवळच माचणूर येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आणि माचणूर किल्ला भीमेच्या काठी आहे. याठिकाणी इसवीसन १६९५ ते १६९९ औरंगजेबाचा मुक्काम होता.त्यावेळी औरंगजेब मंगळवेढे येथील जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असे. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाल्यावर मंगळवेढा किल्ल्याचे महत्व कमी झाले
पहाण्याची ठिकाणे :
आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्लेवजा गढी आहे. त्याला चार सुस्थितील मातीचे बुरुज आहेत. सध्या किल्ल्यात उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती सप्त मातृकांची मुर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात.
किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत. मंदिर परिसरातील शिलालेखात १५७२ साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. विहिरीची रचना सुंदर आहे.काही पायर्या उतरल्यावर ब्रह्मदेवाची दुर्मिळ मुर्ती पहावयास मिळते. विहिरीच्या मध्यभागी गावाच्या बाहेर पडणारे भुयार आहे असे गावकरी सांगतात.
गावातील कॉलेज जवळ प्राचीन मंदिराचे कोरीव दगड,खांब, वीरगळ पाहायला मिळतात.
पोहोचण्याच्या वाटा :
मंगळवेढा हे सोलापूर या जिल्ह्याच्या ठिकाणाहून ५० किमी आणि पंढरपूर पासून २३ किमी अंतरवर असल्याने दोन्ही ठिकाणावरुन बसची उपलब्धता आहे.
राहाण्याची सोय :
मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने राहण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी सोबत बाळगावे
माढा किल्ला
वीरगळींची शिल्पे देताहेत उंदरगावच्या लढाईची व सोलापूर जिल्ह्याच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष! | eSakal
उंदरगावातील (ता. माढा ) ऐतिहासिक मारुती मंदिरात व परिसरात, युद्धात मरण पावलेल्या योद्ध्यांची, घोडदळ, पायदळांच्या युद्धाचे प्रसंग कोरलेली शिल्पे आहेत. ही इ.स. 25 जानेवारी 1700 रोजी झालेल्या उंदरगावच्या ऐतिहासिक लढाईत धारातिर्थी पडलेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ सुमारे 320 वर्षांपूर्वी उभारली गेली असून, ती शिवछत्रपतींची व शंभू छत्रपतींची राजधानी किल्ले रायगडाचा ताबा घेऊन रायगडाला इजा पोचवणाऱ्या मुगल सरदार झुल्फीकारखानच्या उंदरगावात झालेल्या पराभवाची व लढाईत धारातिर्थी पडलेल्या शूर मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देतात.
याचा श्री. चव्हाण यांनी सांगितलेला घटनाक्रम असा, की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाला मुगल सरदार झुल्फीकारखानाचा वेढा पडल्यावर महाराणी येसूबाईंनी रायगड जिद्दीने लढवला. पण नंतर तो झुल्फीकारखानाच्या ताब्यात गेला. त्याने राजधानी रायगडावर प्रचंड नासधूस केली. छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात डिसेंबर 1699 पासून पुढे झुल्फीकारखानाचा व मुगल फौजांचा वावर सोलापूर जिल्ह्यात वाढला. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज सोलापूर जिल्ह्यातच असून ते मुगलांची सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीची मुख्य छावणी उठवून लावण्याचे नियोजन करीत असताना झुल्फीकारखान राजाराम महाराजांना व सरसेनापती धनाजींना जेरबंद करण्यासाठी हालचाली करत होता. "दमरनी-तैमूरनी' म्हणजेच सध्याच्या टेंभुर्णी परिसरात भीमा नदी ओलांडून परतत असताना छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांना ब्रह्मपुरीतील मुगल छावणी उठवून लावण्याचे आदेश दिले. सोबत राणोजी घोरपडे, हणमंतराव, बहिर्जी हे मुख्य पराक्रमी मराठे सरदार होते. धनाजीरावांनी खानापुरातील मुगल ठाण्यावर 23 जानेवारी 1700 रोजी आक्रमण करून खानापूरचा ठाणेदार आवजी आढळा याला कैद केले. त्याला सोडविण्यासाठी झुल्फीकारखान फौजेसह सीना काठालगत ब्रह्मपुरीकडे निघाला; पण पोचायला उशीर झाला व मराठी फौजा पुढच्या टप्प्यात आल्या. या प्रसंगाचे वर्णन औरंगजेबाच्या खासगी दैनंदिनी अखबारात आलेले आहे. त्याच्या मराठी भाषांतरानुसार "झुल्फीकारखानबहादूरनुसरतजंग खजिना व काफीला परांड्याहून ब्रम्हपुरीच्या तळावर आणीत असता, धनाजी जाधव वगैरे मरहठ्ठे सरदार हे दहाहजार स्वार घेऊन "उंदरगाव परगण्यात' चालून आले. चौदा शाबान (तारीख 25 जानेवारी 1700) रोजी उंदरगावात युद्ध झाले'.
रहिमतपूर येथील लढाई 11 जानेवारी 1700, खानापूर येथील लढाई आदी या चकमकींनंतर उंदरगाव येथे झालेल्या लढाईत सरसेनापती धनाजीराव व झुल्फीकारखान पुन्हा आमनेसामने आल्याने धनाजीरावांनी जोरदार हल्ला चढवला. खानासह दाऊदखान, रामसिंग हाडा, राव दलपत बुंदेला हे औरंगजेबाचे सरदार सहभागी असूनही सर्वांना उंदरगावच्या लढाईत पराभव स्वीकारावा लागला. झुल्फीकारखान घाबरून पिछाडीलाच थांबल्यामुळे जिवंत वाचला. झुल्फीकारने मात्र "आपण शंभर मराठे मारून युद्ध जिंकले' अशी खोटी बातमी हेरांमार्फत औरंगजेबला कळविली, परंतु नंतर उंदरगावातील अपमानास्पद पराभवाची खरी हकीकत गुप्तहेरांकडून कळताच औरंगजेबाने मावळ्यांची धास्ती घेत घाबरून ब्रह्मपुरीच्या छावणीभोवतीच फौजफाटा व रसद वाढवण्याचे आदेश दिले. मावळ्यांनी मात्र उंदरगावच्या मातीत झुल्फीकारखानाला पराभूत करीत, छत्रपतींच्या रायगडाला इजा पोचवल्याचा बदला घेतला.
त्याकाळी उंदरगाव हा स्वतंत्र तालुका होता. तेव्हाच्या उंदरगाव तालुक्यात तब्बल 29 ते 31 गावे समाविष्ट असून "इंद्रगाव ऊर्फ उंदरगावपरगणाह' हा 1 लाख 250 रुपये आठ पैसे महसुलासह पूर्ण तालुका बराच काळ तारागढ व सांभर येथील घराण्याच्या दक्षिणेत आलेल्या वारसांपैकी रावप्रतापसिंह चव्हाणसांभरीराव व त्यांच्या मुलांच्या अमलाखाली असून ते शेवटपर्यंत स्वराज्यातर्फे लढले. "मांडवा-मांडोह परगणाह' अर्थात आताच्या माढा तालुक्यात 28 गावे समाविष्ट होती व महसूल 66 हजार 641 रुपये आठ पैसे होता.
माढा व आसपासच्या तालुक्यांतील गावे म्हसवडच्या नागोजी मानेदेशमुखांना छत्रपती राजाराम महाराजांनी 1699 मध्ये देशमुखीत दिली होती. सन 1700 मध्येच मुतालीबखानाने रावप्रतापसिंहांची परांडा इलाख्यातील चकमकीत कपटाने हत्या घडवून आणली. सध्या रावप्रतापसिंहांची तेरावी पिढी उंदरगाव व माढा येथे राहात असून, गावगाड्यातील प्रमुख अधिकारी असलेले प्रमुख मानकरी वतनदार व जमीनदार नाईकवाडी, लवटे, सुतार, म्हस्के आदी नामवंत जमीनदार होते.
या लढाईचा प्रसंग कोरलेल्या सात-आठ वीरगळी उंदरगावात असून त्यावर युद्ध करणारे योद्धे व ते युद्धात मरण पावल्यानंतर त्या योद्ध्यांच्या आत्म्याला स्वर्गात घेऊन जाताना स्वर्गातील दासी व सर्वात शेवटी कैलासात शिवलिंगाची उपासना करताना मरण पावलेल्या योद्ध्याचा आत्मा अशा तीन टप्प्यांत शिल्पपट कोरलेल्या वीरगळ असून, या योद्ध्यांची आठवण पुढील पिढ्यांना राहण्यासाठी वीरगळ कोरण्याची प्रथा प्रचलित होती, जी उंदरगावातील तेव्हाच्या समाजाने 25 जानेवारी 1700 रोजीच्या लढाईनंतर शिल्परूपातून जपल्यामुळेच आज ही शिल्पे सापडली व उंदरगावच्या लढाईचा इतिहास उजेडात आला.
याबाबत माढा-उंदरगावचे इतिहास संशोधक मयूर चव्हाण म्हणतात, सोलापूर जिल्ह्यात औरंगजेब आला व पराभवाच्या अनेक वार्ता त्याने याच जिल्ह्यात ऐकल्या. झुल्फीकारखानाचीही मिजास "उंदरगावच्या लढाईत' धुळीस मिळून "रायगडाच्या अवमानाचा बदला घेणारी युद्धभूमी' अशी उंदरगावची व सीना नदीकाठाची स्वतंत्र ओळख आहे. या ऐतिहासिक घटनेच्या संशोधनासाठी मुगल दरबारचे औरंगजेबकालीन अखबार, मुगलांच्या प्रशासकीय व्यवस्थेवरील शहाजहानकालीन व औरंगजैबकालीन साधने, पत्रव्यवहार आदींचा आधार घेतला असून, तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षकवृंदांनी हा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावा. जिल्ह्यातील अनेक गावांत असणाऱ्या अशा ऐतिहासिक ठेव्याची निगा राखण्यात शासनाने पुढाकार घ्यावा.
माढा गढी/किल्ला (Madha Fort) किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर
जिल्हा हा तिथे असलेले मजबूत भुईकोट किल्ले/गढी यांसाठी ओळखला जातो.
इतिहासातील अनेक नामवंत सरदार पदाधिकारी यांच्या गढया जिल्ह्यात सर्वत्र
पहावयास मिळतात. त्यांचे अवशेष काही प्रमाणात आजही त्यांच्या ऐतिहासिक
पणाची साक्ष देत आहेत.
पहाण्याची ठिकाणे :
सोलापूर
जिल्ह्यातील एक महत्वाचे तालुक्याचे ठिकाण म्हणजे माढा होय. माढा गावातच
मध्यवर्ती ठिकाणी रावरंभा निंबाळकर यांनी बांधलेला एक गढीवजा किल्ला आहे.
गढीचे प्रवेश द्वार आणि तटबंदी सुस्थितीत आहे. नगरपालिकेने
प्रवेशद्वाराच्या दुतर्फा शोभिवंत वृक्षांची लागवड केलेली आहे. गढीला चार
बाजूंना चार गोलाकार बुरूज आहेत. गढी मध्ये प्रवेश केल्यावर उजवीकडे वळून
पायर्यांच्या द्वारे तटबंदीवर तसेच बुरुजावर जाता येते. बुरुजांवर तोफा
ठेवण्यासाठी केलेला मोठा उंचवटा स्पष्टपणे दिसून येतो. बऱ्याच ठिकाणी
अंतर्गत बाजूने तटबंदीची पडझड झाल्याने गढीला पूर्ण फेरी तटबंदीवरून मारता
येत नाही. गढीच्या मध्यभागी एका जुन्या मोठ्या बारवेचे दर्शन होते. परंतु
सर्वत्र वाढलेल्या झाडाझुडपांनी या बारवेची रचना नीट लक्षात येत नाही.
तटबंदीच्या खालील बाजूस काही खोल्यांची रचना केलेली दिसून येते. तसेच एक
अर्धा तुटलेला रांजण जमिनीत गाडला गेलेला आहे. गढीच्या बाहेरील बाजूस सध्या
शाळेची इमारत आहे. काही वर्षांपूर्वी ही शाळा गढीमध्ये भरत असे. शाळेच्या
आवारातच अजून एक विहीर अथवा बारव दिसून येते. ती बऱ्याच प्रमाणात बुजलेली
आहे. पूर्ण गढी पाहण्यासाठी अर्धा ते पाऊण तास पुरेसा आहे.
गढी पासून
काही अंतरावरच ग्रामदैवत माढेश्वरी देवीचे जुने मंदिर पाहण्यासारखे आहे.
करमाळ्याच्या कमळाई देवी मंदिरा सारखीच रचना या मंदिराची आहे. पंचायतन
प्रकारातील हे मंदिर प्रशस्त असून सहसा महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये न
दिसणारी गोपूर रचना येथे दिसून येते. प्रवेश द्वाराच्या उजवीकडे जमिनीत
बसवलेली चार बाजूंनी कोरलेली वीरगळ सुस्थितीत आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
सोलापूर
ते माढा ६५ किलोमीटर अंतर आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी या
गावापासून माढा हे ठिकाण ३५ किलोमीटर अंतरावर आहे. कुर्डूवाडी हे जवळचे
रेल्वे स्थानक माढ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
माढा
प्रकार : गढी
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
पुणे-सोलापूर
रस्त्यावर टेंभूर्णीपासुन ३५ कि.मी.अंतरावर तर कुर्डूवाडीपासून १२ कि.मी.
अंतरावर माढा हे सोलापूरच्या माढा तालुक्याचे गाव आहे. येथील ग्रामदैवत
माढेश्वरी देवीच्या नावावर या गावाचे नाव माढा असे पडले. माढा गावात आजही
सुस्थितीत असा छोटेखानी देखणा भुईकोट आहे. माढा किल्ल्याचे प्रवेशद्वार
उत्तराभिमुख असुन क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमी आहे. या किल्ल्याची निर्मिती
रावरंभाजी निंबाळकर यांनी १७१० साली केली. किल्ला आजही रावरंभा निंबाळकर
यांचे नववे वंशज यशवंत आनंदराव निंबाळकर यांच्या ताब्यात असुन किल्ल्याच्या
आतील वास्तुंची पुर्णपणे पडझड झाली आहे. माढेश्वरी मंदिरावरून किल्ल्याकडे
जाताना सर्वप्रथम वेशीवर मारुतीचे मंदिर लागते. मंदिराच्या पुढिल बाजुस एक
भलीमोठी दगडी बांधणीची मोटेची विहीर आहे. या विहिरीच्या शेजारून जाणाऱ्या
वाटेने किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाता येते. किल्ल्याच्या दरवाजासमोरील
मोकळ्या पटांगणात स्वच्छ भारत योजनेला हरताळ फासल्याने नाकाला रुमाल लावत
जपुन पावले टाकत किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जावे लागते. समाधानाची एकच
गोष्ट कि गावकरी यासाठी किल्ल्याच्या आतील भागाचा वापर करत नाहीत.
दरवाजातून प्रवेश केल्यावर आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन
समोरच एका चौसोपी वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या चौकात दगडी कारंजे
असल्याच्या खुणा दिसुन येतात. दरवाजाच्या वरील भागात कधीकाळी नगारखाना अथवा
मंडप असल्याचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या दरवाजा शेजारील तटबंदी सोडल्यास
पुर्ण किल्ल्याची तटबंदी सुस्थितीत असुन तटबंदीवरून संपुर्ण किल्ल्याला
फेरी मारता येते. किल्ल्याच्या चारही टोकाला चार मोठे बुरूज असुन त्यावर
तोफ ठेवण्याचा उंचवटा दिसुन येतो. या उंचवट्या खाली तोफगोळे ठेवण्यासाठी
कोनाडे बनवले आहेत. तटबंदीवर जाण्यासाठी प्रत्येक बाजुस एक अशी चार ठिकाणी
पायऱ्यांची सोय आहे. किल्ल्याच्या आतील भागातील वास्तू मोठया प्रमाणात पडझड
झाल्याने मातीखाली गाडल्या गेल्या आहेत. गडाच्या संपुर्ण तटबंदीत एकुण सहा
खोल्या बांधलेल्या असुन पश्चिमेकडील तटबंदीत तीन ओवऱ्या व उत्तरेकडील
तटबंदीत दारूगोळ्याचे कोठार आहे. शिवाय कोटाच्या मध्यभागी एक ५०-६० फुट खोल
व ५-६ फुट रुंद अशी एक दगडी बांधीव विहीर असुन या विहिरीचे पाणी संपुर्ण
किल्ल्यात सायफन पद्धतीने म्हणजेच हवेच्या दाबाने फिरवलेले दिसुन येते.
डावीकडच्या तटावर अलीकडेच स्थापन केलेली एक शंकराची पिंड दिसते. दरवाजाच्या
आतील बाजुस उजवीकडे एक भुयार आहे पण त्याचा आतील भाग ढासळल्याने आत शिरता
येत नाही. हे भुयार माढेश्वरी मंदिरात उघडते असे सांगितले जाते. पूर्वी या
किल्ल्यापासून ते माढेश्वरी मंदिरापर्यंत भुयारी रस्ता होता व त्याचा वापर
किल्ल्यावरील स्त्रियांना देवळात येण्यासाठी होत असे असे सांगितले जाते.
मंदिराच्या बाजूने ते भुयार बंद केलेले असुन तेथील एका ओवरीत बंद केलेल्या
दरवाजाच्या बांधकामाच्या खुणा दाखवल्या जातात. किल्ल्याच्या पुर्वेकडील
तटबंदीबाहेर एक खुप मोठी चौकोनी बारव असुन तिच्या आत उतरण्यासाठी पायऱ्या
आहेत. या बारवच्या मागील बाजुस असणाऱ्या तटबंदीत एक लहान दरवाजा दिसुन येतो
पण तो सध्या दगड लावुन बंद करण्यात आला आहे. हा भाग भोवताली छोटीशी तटबंदी
घालुन बंदीस्त करण्यात आला आहे. हे सर्व व संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास
पुरेसा होतो. शिवाजी महाराजांचे जावई महादजी निंबाळकर यांच्या
दासीपुत्राचा मुलगा रंभाजी निंबाळकर यांना १७०७ मध्ये माढ्याची जहागिरी
मिळाली. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार रावरंभा निंबाळकर यांची राजगादी इथे
होती व नंतरच्या काळात ती करमाळा येथे नेण्यात आली. माढा किल्ला हा १७१०
साली रंभाजी निंबाळकर यांनी बांधला. छत्रपती संभाजी महाराजांच्या
मृत्यूनंतर रंभाजी निंबाळकर आणि चंद्रसेन जाधव यांनी मुघलांची चाकरी
पत्करली. १७०७ साली झालेल्या पुरंदरच्या लढाईत रंभाजीने मुघलांकडून लढताना
बाळाजी विश्वनाथ आणि हैबतराव निंबाळकर याचा पराभव केला आणि
निजाम-उल-मुल्कने त्यांना राव अशी पदवी दिली. १७व्या शतकात काहीकाळ रावरंभा
निंबाळकरांकडे पुणे सुभ्याची जहागिरी होती असे सांगितले जाते. खर्डा येथील
१७९५ च्या मराठे आणि निजाम यांच्यातील लढाईत रावरंभा निंबाळकर यांनी
पराक्रम करून निजामाला वाचवले.
© Suresh Nimbalkar
बेगमपुर
प्रकार : भुईकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे या उतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला. माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर. औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते.
बेगमपुर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात. गावातुन किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम किल्ल्याच्या अलीकडेच एका गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार व त्यासमोर गलबताचा नांगर पडलेला दिसतो. गढीच्या मागील बाजुस ढासळलेले दोन बुरूज दिसुन येतात. बेगमपुर भुईकोट किल्ल्यात शिरताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळ व त्याचे दोन बुरूज दिसुन येतात. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. रणमंडळाचे व किल्ल्याचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या असुन आतील बाजूने वर दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मूळ टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यात नंतरच्या काळात खुप मोठे बदल केलेले दिसुन येतात. किल्ल्यातील दर्गा व मस्जिद या वास्तू किल्ला बांधणीच्या काळातील नसुन नंतरच्या काळात बांधलेली असावीत. किल्ल्याचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही किल्ल्याचे आठ व रणमंडळाचे दोन असे दहा बुरूज सुस्थितीत दिसुन येतात. कोपऱ्यातील बुरुज दुमजली असुन त्यांना वरील भागात जाण्यासाठी अंतर्गत पायऱ्या आहेत. बुरुजावरून तटावर जाता येते. मूळ १५ फुट असणारी तटबंदी नंतर २०-२५ फुटापर्यंत वाढवलेली असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. किल्ल्याला आपण शिरलेल्या दरवाजाशिवाय उजव्या बाजुस दोन व मागील बाजुस एक अशी अजुन तीन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस दुसऱ्या टोकाला एक मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातील दरवाजाने खाली नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची व समोरील तिच्या शिक्षकाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस नदीकिनारी असलेला बुरूज सर्वात उंच असुन हा भाग किल्ल्यापासून थोडा सुटावलेला आहे. या बुरुजावर थेट नदीतुन पाणी खेचण्यासाठी रहाट बसविण्याची सोय दिसुन येते. येथुन किल्ल्याला वळसा मारून दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. इ.स.१८८४ सालच्या सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटनुसार माचणूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे. जवळच औरंगजेबचा तळ होता. माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलिकडील किनाऱ्यावर बेगमपूर हे बादशहाच्या बेगमची कबर असलेले गाव आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याकडे असुन संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुरातत्त्व खात्याने अंतर्गत भागात काही ठिकाणी दुरुस्ती केली आहे.
© Suresh Nimbalkar
धोत्रीचा किल्ला
सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावात एक सुस्थितील गढी आहे, या गढीला धोत्रीचा किल्ला या नावाने ओळखले जाते. या गढीतील मातीच्या बुरुजात बनवलेला वळणदार जिना पहाण्यासारखा आहे.
9 Photos available for this fort
Dhotri Fort (Gadhi)
पहाण्याची ठिकाणे :
धोत्री गावातून किल्ल्याच्या एका भव्य बुरुजाला वळसा घालून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी येतो. किल्ल्याचा उत्तराभिमुख मुख्य प्रवेशव्दार १२ फूट उंच आहे. या प्रवेशव्दाराला नविन लाकडी दरवाजा बसवलेला आहे. प्रवेशव्दाराजवळील तटबंदीत सज्जा आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर दोनही बाजूंना देवड्या आहेत. समोर आयताकृती रिकाम मैदान आहे. त्याच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या सर्व तटबंदीच्या व बुरुजांच्या भिंती पांढर्या मातीच्या बनवलेल्या आहेत. त्यांना आतील व बाहेरच्या बाजूने संरक्षणासाठी दगड व विटा लावलेल्या आहेत. बुरुज व तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. उजव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला पायर्यांची सुकलेली चौकोनी विहिर आहे. बालेकिल्ल्याला चार बुरुज आहेत. दक्षिण टोकावरील मातीच्या भव्य बुरुजात बुरुजावर जाण्यासाठी वळणदार जीना आहे. या जिन्याने बुरुजावर चढून गेल्यावर संपूर्ण किल्ला दिसतो व किल्ल्याची रचना समजते. बुरुजावरून खाली उतरून आल्यावर बाजूच्या तटबंदीत एक अर्धवर्तूळाकार छ्त असलेली खोली आहे. या तटबंदीच्या कडेकडेने पश्चिमेकडील तटबंदीकडे चालत जातांना वाटेत वास्तूंचे उध्वस्त अवशेष पहायला मिळतात. पश्चिमेच्या तटबंदीत एक झुडूपांनी झाकलेला छोटा दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर सर्व बाजूंनी तटबंदीने बंद असलेले आयताकृती मैदान आहे. या मैदानाच्या दोन टोकाला दोन बुरुज आहेत. उजव्या बाजूला एक कोरडी विहिर आहे. हे सर्व पाहून झाल्यावर किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
पोहोचण्याच्या वाटा :
१) सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर पासून १९ किमीवर कर्देहळ्ळी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. कर्देहळ्ळी पासून १४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
२) सोलापूर - हैद्राबाद रस्त्यावर सोलापूर पासून १५ किमीवर ब्राम्हणी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. या रस्त्याने मुसळी - तांदुळवाडी मार्गे २४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
धोत्री गावात राहण्याची सोय नाही. सोलापूर किंवा अक्कलकोट येथे रहाण्याची चांगली सोय आहे.
जेवणाची सोय :
धोत्री गावात जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
किल्ला पहाण्यासाठी अर्धा तास लागतो.
सूचना :
सोलापूरहून सकाळी निघून धोत्री किल्ला पाहून नळदुर्ग किल्ला पहायला जावे.
![]() |
| Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur |
![]() |
| Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur |
![]() |
| Entrance to Dhotri Fort at Dhotri Village near Solapur |
![]() |
| Quadrangle of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur |
![]() |
| Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur |
![]() |
| Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur |
![]() |
| Way to Akkalkot Fort from Dhotri Fort at Dhotri Village near Solapur |
![]() |
| Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur |
![]() |
| Entrance to Dhotri Village near Solapur |
Dhotri Fort
Type: Land Fort- Gadhi
Base Village: Dhotri
Where: 270 Kms from Pune, 25 Kms from Solapur
Route Taken: Pune-Solapur-Dhotri (Take Solapur-Hannur internal road, off Solapur-Hyderabad expressway)
Time visited: Jan 2014Time to see: 0.5 hrs.
Food/Water: Food/Stay is available only at Solapur.
Parking: Park your vehicle near the Main entrance (Gav- Ves). It’s a 5 min walk through narrow lanes till the entrance of the fort.
Well this might not be a really a worth effort to go explicitly to this place unless you are either really enthusiastic about historical places OR you are travelling in interiors of Solapur. For me it was both and hence decided to take a look at this unknown place. Things to see are a Dry well, A store room beneath the South Bastion and a stupendous curved staircase.
Main Courtyard
Huge courtyard in the center and the expanse of the fort in the left (as seen from above)
The most interesting feature is curved staircase on the south Bastion.
There is small door on the right that open in huge area. Just on the left the entrance to the staircase to south bastion is hidden in the bushes. You will need to climb down slowly...
The Staircase
While coming down
While coming down- further below
The Panorama of the village from the Top
Fortification seems to be of thick Stone and Mud Walls
http://ekpravas.blogspot.com/2014/01/dhotri-fort.html
धोत्री
प्रकार : गढी
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर पासून २४ कि.मी.अंतरावर धोत्री गावात धोत्रीचा किल्ला आहे. मध्ययुगीन काळात बांधलेला हा किल्ला भुईकोट प्रकारातील असुन किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नाही. सोलापुरहुन धोत्री गावात जाताना दुरवरून गडाची तटबंदी व बुरूज आपले लक्ष वेधुन घेतात. रस्त्यावरूनच किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत असल्याने सहजपणे किल्ल्यात जाता येते. साधारण आयताकृती आकार असलेला हा किल्ला पूर्व-पश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ दोन एकर आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण दहा बुरूज असुन त्यातील दक्षिणेच्या कोपऱ्यातील दोन बुरूज एकमेकाशी जोडून आहेत. दहा बुरुजापैकी कोपऱ्यातील चार बुरूज मोठया आकाराचे व तटबंदीतील उरलेले सहा बुरूज मध्यम आकाराचे आहेत. किल्ल्याच्या तटबंदी व बुरुज पांढऱ्या चिकट मातीच्या बनवलेल्या असुन त्यांना मजबुती देण्याकरता खालील भागात आतुन व बाहेरून दगडी बांधकाम केलेले आहे तर वरील बाजुस विटा लावलेल्या आहेत. बुरुज व तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेला बालेकिल्ला सुरक्षित करण्यासाठी त्याला बाहेरील बाजूने अजुन एक तटबंदी घालुन दुहेरी तटबंदीने सुरक्षित केला आहे. त्यामुळे किल्ला तीन भागात विभागला गेला असुन रणमंडळातून आत आल्यावर मुख्य दरवाजातून आत न जाता बाहेरील दोन तटबंदीच्या मधील भागात फिरता येते. या भागात प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने शेवटपर्यंत जाता येत नाही. हा झाला किल्ल्याचा पहिला भाग. या तटबंदीत शिरण्यासाठी दरवाजा असावा पण तो पुर्णपणे कोसळून गेला आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन कधीकाळी दरवाजासमोर असणारी रणमंडळाची रचना पुर्णपणे ढासळून गेलेली आहे. प्रवेशव्दारा जवळील तटबंदीत सज्जा असुन प्रवेशव्दाराला अलीकडे लाकडी दरवाजा बसवलेला दिसुन येतो. किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार १२ फूट उंच असुन दरवाजाच्या आत दोनही बाजुला पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. यातील एका देवडीतुन वर सज्जावर व तिथुन बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच मोकळे मैदान असुन त्याच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. डाव्या बाजुच्या तटबंदीतील कोपऱ्याच्या बुरूजात एक कोठार दिसुन येते. किल्ल्याचा हा दुसरा भाग असुन उजव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारालाही पहारेकऱ्यासाठी दोन्ही बाजुस देवड्या असुन आत शिरल्यावर उजव्या बाजूला पायऱ्या व त्याच्या टोकाशी कमान असणारी चौकोनी विहिर आहे. विहीरीत पाणी असुन ते पिण्यायोग्य आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार बुरुज दिसतात पण प्रत्यक्षात दक्षिण दिशेचे दोन बुरुज बाहेरील तटबंदीत आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला असलेल्या टोकावरील मातीच्या भव्य बुरुजात बुरुजावर जाण्यासाठी बुरुजाच्या आतुनच वळणदार पायऱ्या आहेत. किल्ल्यातील हा सर्वात मोठा व उंच बुरूज असुन या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दिसतो व किल्ल्याची रचना लक्षात येते. बुरुजावरून खाली उतरून आल्यावर बाजूच्या तटबंदीत एक अर्धवर्तूळाकार छ्त असलेली खोली आहे. किल्ल्याचे अंतर्गत अवशेष पुर्णपणे ढासळलेले असुन असुन त्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने अवशेषांची शोधयात्रा करावी लागते. बुरुजाच्या अलीकडे काही अंतरावर जमिनीला समांतर पायऱ्या असुन जमिनीखाली १५ x २० फुट आकाराचे तळघर आहे. तळघराच्या पुढील बाजुस अजुन एका वास्तूचा दरवाजा दिसतो. हि वास्तू दोन दालनाची असुन पायऱ्या उतरून कवळ पहिल्या दालनापर्यंत जाता येते. येथे खूप मोठया प्रमाणात वटवाघुळ असल्याने दुसऱ्या दालनात शिरता येत नाही. या भागातील तटबंदीत अनेक उध्वस्त वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. हा बालेकिल्ल्याचा भाग असुन किल्ल्याचा तिसरा भाग आहे. पश्चिमेच्या तटबंदीत एक झुडूपांनी झाकलेला छोटा दरवाजा असुन या दरवाजाने आपल्याला सर्वप्रथम पाहिलेल्या पहिल्या भागाच्या टोकाशी जाता येते. या दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुला पायऱ्या असणारी दुसरी मोठी चौकोनी विहीर दिसते. हि विहीर गाळाने भरलेली असुन आतील पाणी पिण्यायोग्य नाही. समोर सर्व बाजूंनी तटबंदीने बंद असलेले आयताकृती मैदान दिसते. या तटबंदीच्या दोन टोकाला दोन बुरुज असुन डाव्या बाजुच्या बुरुजावर जाण्यासाठी विटांनी बांधलेला बंदिस्त कमानीदार मार्ग दिसतो पण तिथे जाण्याची वाट मात्र अतिशय बिकट आहे. या बुरूजावर जाण्यासाठी विहिरीच्या वरील बाजुस असणारा दरवाजा माती पडुन पुर्णपणे बुजला असुन वरची केवळ कमान दिसते. या कमानीतून आपल्याला अक्षरशः पोटावर सरकत शिरावे लागते पण आत आल्यावर मात्र हि धडपड सार्थ झाल्याची वाटते. या बुरुजावरून देखील संपुर्ण किल्ला दिसतो. या तटबंदीच्या बाहेरील बाजूला तटबंदीला लागुनच एक तलाव व त्याच्या काठावर लहानसे मंदिर दिसते. येथे आपली किल्ल्याची फेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास दीड तास लागतो.
© Suresh Nimbalkar
धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi)) किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावात एक सुस्थितील गढी आहे, या गढीला धोत्रीचा किल्ला या नावाने ओळखले जाते. या गढीतील मातीच्या बुरुजात बनवलेला वळणदार जिना पहाण्यासारखा आहे.
पहाण्याची ठिकाणे :
धोत्री गावातून किल्ल्याच्या एका भव्य बुरुजाला वळसा घालून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी येतो. किल्ल्याचा उत्तराभिमुख मुख्य प्रवेशव्दार १२ फूट उंच आहे. या प्रवेशव्दाराला नविन लाकडी दरवाजा बसवलेला आहे. प्रवेशव्दाराजवळील तटबंदीत सज्जा आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर दोनही बाजूंना देवड्या आहेत. समोर आयताकृती रिकाम मैदान आहे. त्याच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या सर्व तटबंदीच्या व बुरुजांच्या भिंती पांढर्या मातीच्या बनवलेल्या आहेत. त्यांना आतील व बाहेरच्या बाजूने संरक्षणासाठी दगड व विटा लावलेल्या आहेत. बुरुज व तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. उजव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला पायर्यांची सुकलेली चौकोनी विहिर आहे. बालेकिल्ल्याला चार बुरुज आहेत. दक्षिण टोकावरील मातीच्या भव्य बुरुजात बुरुजावर जाण्यासाठी वळणदार जीना आहे. या जिन्याने बुरुजावर चढून गेल्यावर संपूर्ण किल्ला दिसतो व किल्ल्याची रचना समजते. बुरुजावरून खाली उतरून आल्यावर बाजूच्या तटबंदीत एक अर्धवर्तूळाकार छ्त असलेली खोली आहे. या तटबंदीच्या कडेकडेने पश्चिमेकडील तटबंदीकडे चालत जातांना वाटेत वास्तूंचे उध्वस्त अवशेष पहायला मिळतात. पश्चिमेच्या तटबंदीत एक झुडूपांनी झाकलेला छोटा दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर सर्व बाजूंनी तटबंदीने बंद असलेले आयताकृती मैदान आहे. या मैदानाच्या दोन टोकाला दोन बुरुज आहेत. उजव्या बाजूला एक कोरडी विहिर आहे. हे सर्व पाहून झाल्यावर किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
पोहोचण्याच्या वाटा :
१) सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर पासून १९ किमीवर कर्देहळ्ळी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. कर्देहळ्ळी पासून १४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
२) सोलापूर - हैद्राबाद रस्त्यावर सोलापूर पासून १५ किमीवर ब्राम्हणी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. या रस्त्याने मुसळी - तांदुळवाडी मार्गे २४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
धोत्री गावात राहण्याची सोय नाही. सोलापूर किंवा अक्कलकोट येथे रहाण्याची चांगली सोय आहे.
जेवणाची सोय :
धोत्री गावात जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
किल्ला पहाण्यासाठी अर्धा तास लागतो.
सूचना :
सोलापूरहून सकाळी निघून धोत्री किल्ला पाहून नळदुर्ग किल्ला पहायला जावे.
माचणूर (Machnur) किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर - पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वहात जाणार्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या मंदिराजवळच माचणूरचा किल्ला आहे.
इतिहास :
दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्या पासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.
या किल्ल्याच नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराची पिंड (शिवलींग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास - नूर असे म्हटले जाऊ लागले.पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.
पहाण्याची ठिकाणे :
माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारा समोर भिंत व दोन बुरुज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदीच्या मागिल बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे.
सिध्देश्वर मंदिर :- माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायर्या उतरून दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
माचणूर गाव सोलापूर - पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी व पंढरपूरपासून २१ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १२ किमी अंतरावर आहे. गावात जाणार्या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
माचनूर किल्ला
सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच औरंगजेबाचा किल्ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ 1694 ते 1701 या काळात तेथे होता. स्वत: औरंगजेबही त्या काळात तेथे राहत असे. किल्ला व तेथील बुरुज काही ठिकाणी मोडकळीस आले आहेत. किल्ल्याचा परिसर मोठा असून आतमध्ये रान माजले आहे. तेथे वस्ती नाही. जवळूनच भीमा नदी वाहते.
किल्ल्यातच एक पडकी मशीद आहे व बाजूला एक कबर दिसते. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे लोक म्हणतात, पण नक्की माहिती कोणालाच नसल्याने ती कबर कोणाची हा प्रश्न पडतो. सोलापूरचे शासकीय पुरातत्त्व खाते तेथील कारभार पाहते.
मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला आहे. दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते. माचणूरचे मंदिर प्राचीन आहे. ते केव्हा बांधले गेले याचा उल्लेख नाही. पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते, कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या किल्ल्यात 1694 ते 1701 पर्यंत मुक्काम होता. त्या काळात त्याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. (भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था मोठा चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही.) त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्या प्रदेशातील भुंगे वा मधमाशा यांनी त्याच्या सैन्याला सळो, की पळो करून हुसकून लावले. नंतर औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. त्या ऐतिहासिक घटनेबद्दलच्या प्रचलित दंतकथेत औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्यानंतर नैवेद्याच्या ताटावरील कापड दूर सारताच गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसल्याचा उल्लेख आहे. मांसाचा नूर पालटला म्हणून ‘मासनूर’चे नंतर अपभ्रंशाने माचणूर झाले.
माचणूर गावात जाणा-या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते. रस्ता संपतो तेथे औरंगजेबाचा किल्ला आहे. सिद्धेश्वराचे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मंदिराच्या घडणीत तुळजापूरच्या मंदिराशी साम्य जाणवते. दगडी प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताना दोन्ही अंगांना पहारेक-यांच्या देवड्या दिसतात. डाव्या हाताला शंकराचे लहान मंदिर आहे. पाय-या उतरून पुढे गेल्यानंतर दुसरे प्रवेशद्वार लागते. त्या द्वाराच्या दोन्ही बाजूंना भिंतीत विरगळी बसवलेल्या आहेत.

सिद्धेश्वराच्या मंदिराभोवती तटबंदी उभारली आहे. मंदिरासमोर तीन फूट उंचीचा भव्य नंदी आहे. गाभाऱ्यात सिद्धेश्वराची (शंकराची) पिंडी आहे. चांदीचा भव्य मुखवटाही आहे. तेथे जाण्यासाठी दोन दरवाजे ओलांडून जावे लागते. त्यापैकी पहिला दरवाजा पाच फूट उंचीचा तर दुसरा अडीच फूट उंचीचा आहे. त्या दरवाजातून वाकून पुढे गेल्यानंतर गाभा-यात प्रवेश करता येतो. मंदिराबाहेर जुने, मोठे पिंपळाचे झाड आहे. महाशिवरात्रीला तेथे यात्रा भरते. मोठा उत्सव साजरा केला जातो. दीड-एक लाख भाविक येतात. पंढरपूरचे बडवे श्रावणात ठराविक काळासाठी माचणूरच्या मंदिरात येऊन पूजा करतात. उजव्या बाजूस, मंदिराच्या तटाला लागून पन्नास पायऱ्या खाली उतरल्यावर भीमानदीच्या किनारी बांधलेला प्रशस्त घाट नजरेत भरतो. नदी पात्रातच मध्यभागी जटाशंकराचे छोटे मंदिर आहे, तेथे बोटीने जाता येते. नदीच्या दुस-या तीराला मल्लिकार्जुन मंदिर आहे. भीमानदीला 1956 साली आलेल्या पूराने मंदिराचा कळस वाहून गेला. पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले. पूर प्रचंड होता, पन्नास पायऱ्या चढून पाणी सिद्धेश्वराच्या मंदिरात सहा फूट उंचीपर्यंत आले होते. त्याची खूण गावकरी दाखवतात.
मंदिराची पूजा ब्रम्हपुरीतील गुरव आळीपाळीने करतात. ब्रम्हपुरीत त्यांच्या चाळीस-पन्नास घरांची वाडीच आहे. सर्वांचे आडनाव पुजारी आहे. सर्वजण शाकाहारी आहेत. देवस्थानाला इनाम म्हणून मिळालेली जमीन बावन्न एकर होती. उजनी धरणात त्यापैकी बावीस एकर गेली व आता ती तीस एकर जमीन आहे. माचणूर गावाच्या पूर्व दिशेस एक मैल अंतरावर भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव आहे. तेथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे.माचणूर हे गाव सोलापूर-पंढरपूर रस्त्यावर आहे. सोलापूरला रेल्वे किंवा बसने पोचता येते. तेथून एस.टी. ने त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून माचणूरला जाता येते. पंढरपूरला रेल्वेने पोचण्याची सोय आहे. तेथून एस.टी. पकडली तर एकवीस किलोमीटर अंतरावर माचणूर गाव लागते. ते गाव मंगळवेढ्यापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे.
सोलापूर – पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वहात जाणार्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या मंदिराजवळच माचणूरचा किल्ला आहे.
इतिहास : दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्या पासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.या किल्ल्याच नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराची पिंड (शिवलींग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास – नूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.
पाहाण्याची ठिकाणे : माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारा समोर भिंत व दोन बुरुज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदीच्या मागिल बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे.सिध्देश्वर मंदिर माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायर्या उतरून दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा : माचणूर गाव सोलापूर – पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी व पंढरपूरपासून २१ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १२ किमी अंतरावर आहे. गावात जाणार्या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे या उतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला. माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर. औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. बेगमपुर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात. गावातुन किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम किल्ल्याच्या अलीकडेच एका गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार व त्यासमोर गलबताचा नांगर पडलेला दिसतो. गढीच्या मागील बाजुस ढासळलेले दोन बुरूज दिसुन येतात. बेगमपुर किल्ल्यात शिरताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळ व त्याचे दोन बुरूज दिसुन येतात. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. रणमंडळाचे व किल्ल्याचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या असुन आतील बाजूने वर दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मूळ टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यात नंतरच्या काळात खुप मोठे बदल केलेले दिसुन येतात. किल्ल्यातील दर्गा व मस्जिद या वास्तू किल्ला बांधणीच्या काळातील नसुन नंतरच्या काळात बांधलेली असावीत. किल्ल्याचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही किल्ल्याचे आठ व रणमंडळाचे दोन असे दहा बुरूज सुस्थितीत दिसुन येतात. कोपऱ्यातील बुरुज दुमजली असुन त्यांना वरील भागात जाण्यासाठी अंतर्गत पायऱ्या आहेत. बुरुजावरून तटावर जाता येते. मूळ १५ फुट असणारी तटबंदी नंतर २०-२५ फुटापर्यंत वाढवलेली असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. किल्ल्याला आपण शिरलेल्या दरवाजाशिवाय उजव्या बाजुस दोन व मागील बाजुस एक अशी अजुन तीन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस दुसऱ्या टोकाला एक मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातील दरवाजाने खाली नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची व समोरील तिच्या शिक्षकाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस नदीकिनारी असलेला बुरूज सर्वात उंच असुन हा भाग किल्ल्यापासून थोडा सुटावलेला आहे. या बुरुजावर थेट नदीतुन पाणी खेचण्यासाठी रहाट बसविण्याची सोय दिसुन येते. येथुन किल्ल्याला वळसा मारून दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. इ.स.१८८४ सालच्या सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटनुसार माचणूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे. जवळच औरंगजेबचा तळ होता. माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलिकडील किनाऱ्यावर बेगमपूर हे बादशहाच्या बेगमची कबर असलेले गाव आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याकडे असुन संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुरातत्त्व खात्याने अंतर्गत भागात काही ठिकाणी दुरुस्ती केली आहे.---
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ इ.स.१६९४ ते १७०१ या काळात येथे होता. स्वत: औरंगजेब त्या काळात तेथे राहत असे. दक्षिणेतील राज्ये संपविण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यांनी त्रासला होता. मराठयांच्या अचानकपणे कोसळणाऱ्या टोळधाडीपासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने मूळ ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास हा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. या गावाचे नाव माचणूर पडण्याबाबत एक लोककथा सांगितली जाते. औरंगजेबाने हा भुभाग जिंकल्यावर सिध्देश्वराचे मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने भयानक हल्ला चढविला व मंदिर उध्वस्त होण्यापासून वाचले. यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने शंकराचा अपमान करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले पण पिंडीपुढे नैवेद्य ठेवल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली. मांसाचा नूर पालटला त्यामुळे या ठिकाणाला मासनूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे मासनूरचे अपभ्रंशाने माचणूर झाले. या प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. गावातुन किल्ल्याकडे जाताना किल्ल्याचा बुरुज व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. माचणूर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळाची रचना दिसुन येते. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. गडाचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या दिसतात. उजव्या बाजुला तटाशेजारी पाण्यासाठी खोदलेला तलाव असुन त्यात खूप मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने नीट पहाता येत नाही. माचणूर किल्ला साडेतीन एकरात पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजघडीला बारा बुरूज दिसुन येतात. नदीच्या बाजूची किल्ल्याची तटबंदी पूरांमुळे पुर्ण कोसळली असुन या तटबंदीतील बुरुज नष्ट झालेले आहेत. उर्वरित तटबंदी १५-२० फुट उंच असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. काही ठिकाणी सिमेंटचा वापर करून पुरातत्त्व खात्याने तटबंदी दुरुस्त केल्याचे दिसते. तटबंदीवर चढण्यासाठी सहा ठिकाणी पायऱ्या असुन किल्ल्याला आपण शिरलेल्या प्रवेशद्वाराशिवाय अजुन दोन प्रवेशद्वारे दिसुन येतात. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला एक पडकी मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदी शेजारी डाव्या बाजुला तटबंदीला लागुन एक कबर दिसते. या कबरीशेजारील भिंतीवर एक पर्शियन शिलालेख दिसतो. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. येथील कोसळलेल्या तटबंदीचे अवशेष व खाली उतरणाऱ्या काही पायऱ्या पहाता या भागात देखील नदीच्या दिशेने उतरणारा दरवाजा असावा. माचनूर किल्ल्याला दोन बाजुनी नदीच्या पात्राने वेढले आहे. भीमा नदी या किल्ल्याला वळसा मारूनच पुढे जाते. दोन बाजूंना नैसर्गिक संरक्षण असल्याने या किल्ल्याचे स्थान भौगोलिकदृष्ट्या उत्तम आहे. उर्वरीत किल्ल्यात रान माजले असुन गावकऱ्यांनी किल्ल्यात एकही अवशेष व त्याचा दगडदेखील शिल्लक ठेवला नाही
![]() |
| बेगमपूर दर्गा/ मस्जिद |
![]() |
| बेगमपूर दर्गा/ मस्जिद |
![]() |
| बेगमपूर दर्गा/ मस्जिद |
![]() |
| बेगमपूर दर्गा/ मस्जिद |
![]() |
| बेगमपूर दर्गा/ मस्जिद |
![]() |
| बेगमपूर दर्गा/ मस्जिदच्या दरवाजा बाहेर आल्यावर समोरच हि दगडी दरवाजाची कमान दिसते आणि त्याचा आत किंवा समोरच एक दगडाचा चौथरा दिसतो. |
मंगळवेढा ते माचणूर अंतर १३ते १४ किमी आहे. मला जीप ने २० मिनट लागली. माचणूर फाट्यावरून चालत किल्ल्यात पोहचायला १० ते १५ मिनटं लागतात. पण त्या आधी मी जवळच असलेल्या श्री सिद्धेश्वरचा प्रचीन मंदिरात गेलो. मंदिरात दर्शन घेऊन मी किल्ल्याकडे निघालो.
सध्या किल्लाची फक्त तीन बाजूंची तटबंदी राहिली आहे. नदीच्या बाजूची तटबंदी राहिली नाही आहे, बाकी किल्ल्यात पूर्ण मोकळा मैदान दिसते. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर समोर नदी कडेच्या बाजूला एक छोटी वास्तू दिसते. तेवढीच एक वास्तू किल्ल्यात आहे. किल्ल्यात पहाण्यासारखं बाकी काही नाही. त्यामुळे किल्ला बघायला १५ मिनटं पुरेशी होतात. मला तरी तेवढा वेळ लागला.
बेगमपूरचा दर्गाच वर्णन
पाच वाजता मी पुन्हा मुख्य रस्त्याला येऊन सरळ सोलापूरला न जाता. पुढेच १ किमी असलेल्या बेगमपुरला
(किंवा बेगमपूर फाट्याला) उतरलो. कारण बेगमपूरला एक दर्गाह आहे त्याला बेगाम्बी दर्गाह म्हणतात. हा दर्गाह जेव्हा आपण माचणूर किंवा मंगळवेढा कडे जातो, तेव्हा नदीच्या पुलावरून डावीकडे किल्ल्यासारखी तटबंदी असलेली मस्जिद नजरेस पडते. त्याचा आकर्षणामुळे मी ती बघायला गेलो.
मचणूर वरून चालत गेलो असतो, तर मला १५ मिनटं लागली असती. पण रस्त्याने जाणाऱ्या छोटा मॅक्स ट्रक वाल्याला सोडायला सांगितले त्यामुळे मी पाच मिनटात बेगमपूरला पोहचलो. मुख्य रस्त्यावरून दर्ग्यापर्यंत पोहचायला ५ मिनटं लागतात. दर्ग्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पुरातत्व खात्याचा राष्ट्रीय संपत्तीं असलेला फलक आहे. दर्गा आतून पाहण्यापेक्षा दर्ग्याची बाहेरील किल्ल्यासारखी तटबंदी, विशेष करून नदीच्या बाजूची तटबंदी पाहण्यासारखी आहे. तीच पूलावरून आकर्षित करते.
तसेच दर्ग्याच्या बाहेर आल्यावर समोरच गावात छोटा दगडी दरवाजाची कमान दिसते आणि समोरच एक दगडाचा चौथरा दिसतो. नक्की ते कोणाचं घर होत का अन्य काही ते मला कळलं नाही. ते बघून मी पुन्हा मुख्य रस्त्याला आलो. दर्गा बघायला मला १० मिनटं लागली. संध्याकाळचे सव्वा पाच वाजले होते, त्यामुळे मी जास्त वेळ दर्गा न बघता गाडी साठी मुख्य रस्त्याला आलो. कारण संद्याकाळी साडे पाच नंतर सोलापूरला जायायला १ तासाने गाडी आहे. म्हणून मी जरा घाई करत मुख्य रस्त्याला एसटी थांब्याला गेलो. मला ५. २५ ची सोलापूर गाडी भेटली.
मराठ्यांच्या पराक्रमाची साक्षीदार असलेला घोडेश्वरचे किल्ला
घोडेश्वरचे किल्ला
मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर जिल्हा हा तिथे असलेले मजबूत भुईकोट किल्ले/गढी यांसाठी ओळखला जातो. इतिहासातील अनेक नामवंत सरदार पदाधिकारी यांच्या गढया जिल्ह्यात सर्वत्र पहावयास मिळतात. त्यांचे अवशेष काही प्रमाणात आजही त्यांच्या ऐतिहासिक पणाची साक्ष देत आहेत.
पहाण्याची ठिकाणे :
सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूर पासून सुमारे तीस कि मी अंतरावर मोहोळ हे तालुक्याचे गाव आहे. गावामध्ये प्रवेश करताच नागनाथ मंदिर विचारताच आपल्याला लगेच उत्तर मिळते कारण कोट किंवा किल्ला असे कोणतेही सलग अवशेष आपणास आज पहावयास मिळत नाहीत. नागेश्वर मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावरूनच मंदिराच्या प्राचिनतेची साक्ष पटते. मंदिराचे दगडी बांधकाम कलात्मकतेने रंगविले झाले. प्रवेशद्वारावर नगारखान्याची रचना केलेली आहे. मंदिर पाहून बाहेर आल्यावर डावीकडे आणखी दोन मंदिरे दृष्टीस पडतात. त्यांच्या परिसरात वीरगळी मांडून ठेवल्या आहेत. याच वाटेने पुढे गेल्यास डाविकडे कोटाचे प्रवेशद्वार दृष्टीस पडते. दोन बाजुंना बुरुज आणि पडलेली तटबंदी आहे. याच वाटेने पुढे उजवीकडे गेल्यावर जमिनीस समांतर अशी एक बारव दिसते. बारवेच्या आत उतरण्यासाठी पायऱ्या असून चारही बाजुंनी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. बारवेच्या वरील बाजूस पाणी बाहेर खेचण्यासाठी दोन मोटांची सोय केलेली दिसते. बारवे तील पाणी पिण्यायोग्य नाही. याला लागूनच कबरींचे काही अवशेष पाहायला मिळतात.याच रस्त्याने पुढे डावीकडे जुन्या घुमटीचे अवशेष नजरेस पडतात. यावरून किल्ल्याच्या मध्ययुगीन बांधकामाची कल्पना येते. आल्या वाटेने आपण आधी पाहिलेल्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येऊन त्यातून पायऱ्यांच्या रस्त्याने सरळ बालेकिल्ल्याकडे जाता येते. पुढे काही अंतरावर देशमुखांचा वाडा पहावयास मिळतो. गावात याशिवाय भानेश्वराचे जुने मंदिर पाहण्यासारखे आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
सोलापूर - पुणे महामार्गावर मोहोळ हे तालुक्याचे ठिकाण सोलापूर पासून ३५ किमी अंतरावर आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मोहोळचा किल्ला
पुणे-सोलापूर रस्त्यावर टेंभूर्णीपासुन ५६ कि.मी.अंतरावर तर सोलापुरपासून ३५ कि.मी. अंतरावर मोहोळ हे तालुक्याचे गाव आहे. गाव फार जुने असुन मराठा कालखंडात मोहोळ येथे सुभ्याची कचेरी होती. येथे एक भुईकोट किल्ला आहे असे म्हणण्याऐवजी होता असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आज आपल्याला किल्ला सलग असा पहाता येत नाही तर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी कोटाचे विखुरलेले अवशेष पाहावे लागतात. मोहोळ गावात किल्ला म्हणुन विचारले असता गावकऱ्याना ठोसपणे सांगता येत नाही म्हणुन किल्ल्याऐवजी नागनाथ मंदीर विचारावे व तेथुन किल्ला पहाण्यास सुरवात करावी. गावाबाहेर ओढ्याच्या काठी प्रशस्त असे नागनाथ मंदीर असुन या भागात बरेचसे अवशेष पहायला मिळतात. मध्ययुगीन बांधकामाची साक्ष देणाऱ्या नागनाथ मंदिराभोवती दगडी तटबंदी असुन संपुर्ण तटबंदीत ओवऱ्या आहेत. मंदीराचे दगडी बांधकाम सुबकतेने रंगविलेले आहे. मंदिराचे बांधकाम किल्ल्याप्रमाणे असुन दरवाजावर नगारखाना आहे. मंदिरासमोरील वाटेने पुढे जाताना अजुन दोन नव्याने बांधलेली मंदीरे दिसतात. मंदिरे जरी नवीन असली तरी मंदिराच्या आवारात विरगळी व प्राचीन मुर्ती आहेत. यातील एका मंदिराबाहेर राशीचक्राचे दुर्मीळ शिल्प आहे. वाटेच्या शेवटी डाव्या बाजुला दोन बुरूजात बांधलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार व शेजारी ढासळलेली तटबंदी दिसते तर उजव्या बाजुस जमीनीशी समांतर एक भली मोठी चौकोनी बारव आहे. हि बारव खर्गतीर्थ म्हणुन ओळखली जाते. या बारवमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असुन आत चारही बाजुला ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याच्या कोनाड्यात विरगळ व शिल्पे ठेवलेली आहेत. बारवच्या वरील बाजुस पाणी खेचण्यासाठी दोन दगडी मोटा असुन पाणी वाहण्यासाठी दगडी पाट बांधलेला आहे. बारवच्या समोरील बाजुस एका चौथऱ्यावर झुडुपात दगडात कोरलेल्या सहा कबरी दिसतात. हे पाहुन झाल्यावर आपण आधी पाहिलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे निघायचे. या दरवाजातून आपण सरळ बालेकिल्ल्याकडे जातो. मोहोळचा किल्ला नगरदुर्ग या प्रकारातील असुन संपुर्ण गावाभोवती तटबंदी व आत खाशा लोकांसाठी तटबंदी व बुरूज असलेली गढी किंवा बालेकिल्ला अशी याची रचना असावी. कधीकाळी मोहोळच्या भुईकोटाच्या बाहेरील तटबंदीत एकुण नऊ दरवाजे होते पण आज मात्र गावाच्या खालील बाजुस आपण प्रवेश केलेला म्हणजेच दक्षिण दिशेला असणारा किल्ल्याचा मुख्य दरवाजा व ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. कोटाचे तीन बुरूज व दोन बाजुची तटबंदी सध्यातरी काही प्रमाणात पहायला मिळतो. बालेकिल्ल्याच्या तटबंदीतील भागात देशमुखांचा वाडा आहे. बालेकिल्ल्याचा दरवाजा वाड्याच्या दरवाजाप्रमाणे बांधलेला असून चांगल्या स्थितीत आहे पण आतील दालन मात्र अलीकडे ढासळलेले आहे. दरवाजातील प्रवेश L आकारात असुन दुसऱ्या दरवाजाच्या आतील उजव्या बाजुस तळामध्ये कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे. बालेकिल्ल्याला एकुण चार बुरूज असुन तीन ढासळलेल्या अवस्थेत आहेत तर चौथा बुरूज व त्या बाजुची तटबंदी वाटेत येत असल्याने नगरपालिकेने २०१६ साली पाडून टाकली. याशिवाय मोहोळमध्ये अकराव्या शतकातील चालुक्यकालीन भानेश्वर हे शिवमंदीर आहे. मंदिराची पडझड झाली असली तरी त्यावरील शिल्पे पाहण्यासारखी आहेत. मोहोळच्या किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नसला तरी स्थानिक देशमुखांच्या सांगण्यानुसार या किल्ल्याची बांधणी राजाराम महाराजांच्या काळात झाली व जिंजीला जाताना त्यांनी मोहोळ येथे एक दिवस मुक्काम केला होता पण याला ठोस पुरावा नाही. गावात आढळणारे अवशेष मात्र मोहोळच्या प्राचीनतेची साक्ष देतात.
मोहोळ परगणाचे गायकवाड़ देशमुख
औरंगजेब बादशहा च्या इस्लाम पुरी तळावरील तसेच पुढील मोहिमेवर " भास्करराव हरकारा " याचा उल्लेख पुन्हा. पुन्हा येतो.
भास्करराव हरकारा स्वत तर बादशहा च्या सेवेत होताच. शिवाय त्यांची दोन मुलें किशनराव .व शंकरराव ही बादशही सेवेत जुलैच्या य1694 ले हजार झालीहोती.
भास्करराव हरकारा यास या भागातील रास्त. मार्ग.किल्ले. गडकोट यांची चागंली माहिती असावी असे दिसते .बादशहा सन 1699 च्या नोव्हेंबरात पन्हाळगडच्या वाटेवर होता.अध्याप तो या गडावर पोच झालेला नव्हता. बादशहा औरंगजेब आमणपूर . ( ताराबाईसाहेब.तास गाव .जिल्हा सांगली )येथे होता.त्यांस भास्कररावाला पन्हाळागड किती दूर आहे याची विचारणा केली. त्यावेळी भास्कररावाने पन्हाळगड 9 कोसावर आहे अशी माहिती औरंगजेब बादशहाला दिली .
हिच गोष्ट पुढे वसंतगडचे अंतर किती आहे असे बादशहा ने भास्कर राव यांना विचारले .यांवरून भास्कर राव हरकारा यांना त्या भागाची भौगोलिक माहिती चागंली होती असे दिसते .बादशहाने पुढे सातारगडाचे मोर्चा लावले .हे मोर्चा आणि त्या जागा कोणत्या बाजूला आहेत यांची माहिती भास्कररावनेच बादशहाला त्याने विचारणा केल्याने य5 डिसेंबर 1699 ला दिलेली आहे असे उल्लेख आहे. भास्करराव हरकारा यास 21 जुलै 1700 रोजी औरंगजेब बादशहा च्या नाराजीचाही सामना करावा लागला .परशुरामपंत प्रतिनिधी व रामचंद्रपंत अमात्य यांची वकील शहाजादा आज्जमकडे गुप्त वाटाघाटी करण्यासाठी आले.अशी वाटाघाटींना शहाजादाने नकार दिला .या वकीलांना त्यांनी छावणी बाहेर केले .सदर वकील हे भास्करराव च्या छावणीत गेले व भास्करराव यांना त्यावेळी आपल्या छावणीत आशय दिला .ही गोष्ट औरंगजेबाला त्याच्या गुप्त हेरा कडुन समजली तेव्हा त्यांना भास्करराव हरकारा यांचा 200 शी चे मनसबदारी होते औरंगजेबानी 50 ने कमी केला .कारण मराठयाचे वकील भास्करराव हरकारा यांचा आपल्या घडित ठेऊन घेतील पन्नास नेतृत्व कमी केला .खरी तरे महाराणी ताराबाईसाहेब यांच्या मार्गदर्शना खाली वरीलपैकी वकील वाटाघाटी साठी आलेत यां वकीलना भास्करराव यांना आपल्या छावणीत आशय कशासाठी दिला कोण होते भास्करराव हरकारा हे पुढील देऊ पण वाटाघाटी करून झुलफखराखान यांना रायगडावर महाराणी युसेबाई व बाल शाहू व महाराणी सकवारबाई ( छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी ) कैदी होत्या त्यांच्या सुटकेसाठी वरील वकील गुपचुप औरंगजेबच्या छावणीत आलेत .भास्करराव यांना घालावे शिक्षाबाबत सियादतखान मध्यस्थी केला भास्करराव निरापराध आहे असे सागंतील तेंव्हा भास्कर राव माझ्या सोबत राहिल असे फर्मान औरंगजेबानी सोडले .बादशहा चा मुक्काम समय (येरला) ई ला नदीवर .आबंवडा .येथे होता .
बादशहा ए मुक्कामाला पुढे निघणेपुर्वी पुढील मुक्काम कोठे करावयाचा यांचाही सल्ला भास्करराव हरकारा कडुन घेत. विशालगडास मोहिम संपवून औरंगजेब बादशहा माघारी फिरवला .23 जून 1702 रोजी मलकापुर येथे पावसामुळे मुल फौजा व बादशहाचे हाल हाल झाले .बादशहा चा शय्यागृहाचा तंबू पावसाने गळू लागला .बादशहा च्या अंगावर पाऊस चे पाणी आले रात्री भर जागरणे केली .नोकर लोकांना तंबू च तणाव मजबूत बाधंल्या नाही म्हणून हमीदुदीनखान यांना शय्यागृहाच्या तणाला स्वतःच ओढून मजबूत बांधला. हमीद्दुदीनखान वर नाराजी होऊन बादशहा ने भास्करराव हरकारा यास विचारले की पावसाचा त्रास होणार नाही असे पुढील मुक्कामाचे ठिकाण कोणते हे सुचविण्यासाठी सागंतील तेव्हा भास्करराव हरकारा यांना सोयीची होतील अशी तीन ठिकाणे बादशहा ला 24जून 1702 रोजी कलविले.
भास्करराव हरकारा यास मराठा सैन्याच्या हालचाली कशा चालू आहेत याबाबत च्या गुप्त बातम्या औरंगजेब बादशहास पोच करण्याची कामगिरी करावी लागते .त्या साठी स्वतंत्र असे 250 चे "जात "ची मनसब वेगळी होती.भास्करराव हरकारा अशा मराठ्याचे सैन्याच्या हालचाली बाबत माहिती देत नाहीत अशी तक्रारी डिसेंबर 1702 ला औरंगजेबा कडे आली .बादशहा ने अशा तक्रारीची दखल घेतली व भास्करराव हरकारा यांचा मनसब 50 ने कमी केला .भास्करराव हरकारा यांचा मुलगा किसनराव याची हरकाराच्या कामावर (बातम्या लिहून पाठविणारा) कामावर बादशहाने तैनात केला .दुसरा मुलगा शंकर राव याची मनसब वाढविण्यात आले भास्करराव हरकारा यास 250 स्वाराची मनसब होती . मोहोळ परगाणा त्याकाळी मंगळवेढा च्या किल्लेदार मुहंमद आकील यांच्या कक्षेत हा परगाणा होता. किल्लेदार मुहंमद आकील यांना भास्करराव हरकारा याने मोहोळ परगाणासाठी मागाणी केली .या मागाणीवर औरंगजेब बादशहानी मोहोळ परगाणा भास्करराव हरकारा यास तनखा य ( पगार ) जहागीर म्हणून 4 आगॅस्ट 1703 रोजी दिला होता . बादशहाने भास्करराव हरकारा यांची तैनात औरंगाबाद सुभ्यात केली असता .त्याच ठिकाणी 25 जानेवारी 1704 रोजी निधन पावला . यावेळी त्याचा मुलगा बादशहाने बोलावून पाठिवले . व मोहोळालाा जहागिर येथे अत्यंविधी झाले .भास्करराव हरकारा यास आणखी एक मुलगा कृष्णा त्यास ही औरंगजेब बादशहाने बोलावून घेतले .त्यास भास्करराव यांच्या निधना नंतर 26 आगॅस्ट 1704 रोजी 4 होन बक्षीस दिले ...........
भास्करराव हरकारा कोण ?
भास्करराव हरकारा गायकवाड घराण्यातील असावा .शिवाय छत्रपतींच्या राणीसाहेब " सकवारबाई" गायकवाडांच्या घराण्यातील होत्या . या दोघांचे जवळचे अथवा दूर चे नाते संबंध असावेत . कारण सकवारबाई इस्लामपुरीच्या तळावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराजांच्या सोबत होत्या . समाधी - आज मोहोळ बसस्थानकाच्या पाठिमागे देशमुखांच्या शेतात इस्लामी पध्दतीने बांधकाम केलेले भास्करराव हरकारा यांची समाधी आहे .या समाधीचे स्थानिक लोक राजे भास्कर ची समाधी म्हणून मानतात . सदर समाधीची उंची 20 फुट असुन लांबी 25 फुट रूंदी 20 फुट आहे तर जाथ 4 फुट चे आहे . सदर समाधीअवस्था आज आता व बाहेरून मस्जीद सारखे कशीसाठी असे बघितले वर मला वाटते उत्तर - भास्करराव हरकारा च्या निधनानंतर औरंगजेब बादशहा च्या फर्माना नुसार हे समाधी बादशहा खर्चाने बाधली तसेच सदर जहागिर भास्करराव हरकारा यांची असेल तर समाधी बादशहा व मोहोळ परगाणा मंगलवेढाचे किल्लेदारच्या देखरेखी खाली झाले असेल्या म्हणून समाधी इस्लामी पध्दती नुसार आत व बाहेरून वाटते .
सदर समाधीचे फोटो इतिहासातील नोंद नुसार मी संतोष झिपरे यांना आमचे मित्र श्री .सुदर्शन मोरे ( वडील .तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ) सागंतील व समाधीचे फोटो उपलब्ध करून दिले त्याबद्दल आभार सुदर्शन मोरे
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळ सोलापूर संस्थापक मनोज भाऊ शिंदे सोलापूर संतोष झिपरे 9049760888 पुर्ण माहिती व लेख
संतोष झिपरे 9049760888
मोहोळ
प्रकार : नगरकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
पुणे-सोलापूर रस्त्यावर टेंभूर्णीपासुन ५६ कि.मी.अंतरावर तर सोलापुरपासून ३५ कि.मी. अंतरावर मोहोळ हे तालुक्याचे गाव आहे. गाव फार जुने असुन मराठा कालखंडात मोहोळ येथे सुभ्याची कचेरी होती. येथे एक भुईकोट किल्ला आहे असे म्हणण्याऐवजी होता असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आज आपल्याला किल्ला सलग असा पहाता येत नाही तर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी कोटाचे विखुरलेले अवशेष पाहावे लागतात. मोहोळ गावात किल्ला म्हणुन विचारले असता गावकऱ्याना ठोसपणे सांगता येत नाही म्हणुन किल्ल्याऐवजी नागनाथ मंदीर विचारावे व तेथुन किल्ला पहाण्यास सुरवात करावी. गावाबाहेर ओढ्याच्या काठी प्रशस्त असे नागनाथ मंदीर असुन या भागात बरेचसे अवशेष पहायला मिळतात. मध्ययुगीन बांधकामाची साक्ष देणाऱ्या नागनाथ मंदिराभोवती दगडी तटबंदी असुन संपुर्ण तटबंदीत ओवऱ्या आहेत. मंदीराचे दगडी बांधकाम सुबकतेने रंगविलेले आहे. मंदिराचे बांधकाम किल्ल्याप्रमाणे असुन दरवाजावर नगारखाना आहे. मंदिरासमोरील वाटेने पुढे जाताना अजुन दोन नव्याने बांधलेली मंदीरे दिसतात. मंदिरे जरी नवीन असली तरी मंदिराच्या आवारात विरगळी व प्राचीन मुर्ती आहेत. यातील एका मंदिराबाहेर राशीचक्राचे दुर्मीळ शिल्प आहे. वाटेच्या शेवटी डाव्या बाजुला दोन बुरूजात बांधलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार व शेजारी ढासळलेली तटबंदी दिसते तर उजव्या बाजुस जमीनीशी समांतर एक भली मोठी चौकोनी बारव आहे. हि बारव खर्गतीर्थ म्हणुन ओळखली जाते. या बारवमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असुन आत चारही बाजुला ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याच्या कोनाड्यात विरगळ व शिल्पे ठेवलेली आहेत. बारवच्या वरील बाजुस पाणी खेचण्यासाठी दोन दगडी मोटा असुन पाणी वाहण्यासाठी दगडी पाट बांधलेला आहे. बारवच्या समोरील बाजुस एका चौथऱ्यावर झुडुपात दगडात कोरलेल्या सहा कबरी दिसतात. हे पाहुन झाल्यावर आपण आधी पाहिलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे निघायचे. या दरवाजातून आपण सरळ बालेकिल्ल्याकडे जातो. मोहोळचा किल्ला नगरदुर्ग या प्रकारातील असुन संपुर्ण गावाभोवती तटबंदी व आत खाशा लोकांसाठी तटबंदी व बुरूज असलेली गढी किंवा बालेकिल्ला अशी याची रचना असावी. कधीकाळी मोहोळच्या भुईकोटाच्या बाहेरील तटबंदीत एकुण नऊ दरवाजे होते पण आज मात्र गावाच्या खालील बाजुस आपण प्रवेश केलेला म्हणजेच दक्षिण दिशेला असणारा किल्ल्याचा मुख्य दरवाजा व ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. बालेकिल्ल्याचे तीन बुरूज व दोन बाजुची तटबंदी सध्यातरी काही प्रमाणात पहायला मिळतो. बालेकिल्ल्याच्या तटबंदीतील भागात देशमुखांचा वाडा आहे. दरवाजापुढे एक घुमटी असुन त्यात एक मुर्ती विरगळ व नागशिल्प मांडुन ठेवले आहेत. बालेकिल्ल्याचा दरवाजा वाड्याच्या दरवाजाप्रमाणे बांधलेला असून चांगल्या स्थितीत आहे पण आतील दालन मात्र अलीकडे ढासळलेले आहे. दरवाजातील प्रवेश L आकारात असुन दुसऱ्या दरवाजाच्या आतील उजव्या बाजुस तळामध्ये कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे. बालेकिल्ल्याला एकुण चार बुरूज असुन तीन ढासळलेल्या अवस्थेत आहेत तर चौथा बुरूज व त्या बाजुची तटबंदी वाटेत येत असल्याने नगरपालिकेने २०१६ साली पाडून टाकली. याशिवाय मोहोळमध्ये अकराव्या शतकातील चालुक्यकालीन भानेश्वर हे शिवमंदीर आहे. मंदिराची पडझड झाली असली तरी त्यावरील शिल्पे पाहण्यासारखी आहेत. मोहोळच्या किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नसला तरी स्थानिक देशमुखांच्या सांगण्यानुसार या किल्ल्याची बांधणी राजाराम महाराजांच्या काळात झाली व जिंजीला जाताना त्यांनी मोहोळ येथे एक दिवस मुक्काम केला होता पण याला ठोस पुरावा नाही. गावात आढळणारे अवशेष मात्र मोहोळच्या प्राचीनतेची साक्ष देतात.
© Suresh Nimbalkar
सांगोला
प्रकार : नगरकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
सोलापूरपासुन ८२ कि.मी व पंढरपूरपासुन ३१कि.मी.अंतरावर वर सांगोला हे तालुक्याचे ठिकाण वसले आहे. मध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे एक स्थानक आहे. मध्ययुगीन कालखंडात सांगोला हे भरभराटीला आलेले शहर होते व त्याची ख्याती सोन्याचे सांगोला अशी होती. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यात शहराचे अतोनात नुकसान झाले व किल्ला पुर्णपणे बेचिराख झाला. आज किल्ला प्रत्यक्षात अस्तित्वात नसुन केवळ वास्तूंच्या आधारे किल्ल्याची स्थाननिश्चिती करावी लागते. जुन्या कागदपत्रातील वर्णनानुसार सांगोला शहराभोवती असणारी तटबंदी म्हणजेच नगरकोट व शहराच्या मध्यभागी असणाऱ्या छोट्याशा टेकडीवर असणारी तटबंदी म्हणजेच बालेकिल्ला अशी याची रचना होती. वाढत जाणाऱ्या सांगोला शहरामुळे नगरकोट व त्याच्या खाणाखुणा पुर्णपणे नामशेष झाल्या असुन मध्ययुगीन कालखंडाशी नाते सांगणारी केवळ एक पायऱ्या, कमान व ओवरी असणारी बारव मोरया गल्लीत दिसुन येते तसेच शिवाजी चौकासमोर असणाऱ्या मंडईत वेशीच्या दरवाजाशेजारी तटबंदीची भिंत काही प्रमाणात दिसते. नगरकोटच्या इतक्याच खाणाखुणा असुन त्याही शोधाव्या लागतात. त्यामानाने बालेकिल्ल्याचे अवशेष थोडेफार दिसुन येतात. शिवाजी चौकातून समोरील उंचवट्यावर जाताना उजव्या बाजुला शेवटची घटका मोजत असणारा किल्ल्याच्या तटबंदीतील एकमेव अवशेष असणारा सहा फुट उंचीचा ढासळलेला बुरूज नजरेस पडतो. या बुरुजाच्या पुढे काही अंतरावर सहा फुट उंचीच्या चौथऱ्यावर उभारलेली जुनी दगडी मस्जिद दिसुन येते. या चौथऱ्याखालील भागात दोन ओवऱ्या असुन एक कोठारवजा खोली दिसुन येते. हा भाग मस्जिदच्या ताब्यात असल्याने आत जाता येत नाही. या चौथऱ्यासमोरच चुना मळण्याचे दगडी चाक दिसुन येते पण घाणा दिसत नाही. काळाच्या ओघात तो नष्ट झाला असावा. याच्या पुढील भागात ब्रिटीशकालीन कोर्टाची इमारत असुन या इमारतीच्या मागील बाजुस किल्ल्याची गडदेवता म्हणजेच क्षेत्रपाल म्हसोबाचे देऊळ आहे. देवळाकडून वाटेने सरळ गेल्यावर उजव्या बाजुला बालेकिल्ल्यास पाणीपुरवठा करणारी पायऱ्यांची चौकोनी बारव आहे. या बारवमध्ये उतरणाऱ्या पायऱ्यांच्या शेवटी एक कमान असलेला दरवाजा आहे.
विहिरीच्या खालील बाजुला उजवीकडे नरसिंहाचे छोटेसे घुमटीवजा लाल रंगात रंगविलेले मंदिर आहे. बालेकिल्ल्याचे आजमितीस इतकेच अवशेष शिल्लक असुन नगरकोटचे व बालेकिल्ल्याचे सर्व अवशेष पहाण्यास एक तास पुरेसा होतो. सांगोला किल्ला आदिलशाही काळात (१४८९–१६८६) बांधला गेला असून गडावरील मशीद त्याच काळात बांधली गेली आहे. तत्कालीन कागदपत्रानुसार सांगोला एक भरभराटीचे शहर असुन त्याची ख्याती सोन्याचे सांगोला अशी होती. इ.स.१६८६ मध्ये आदिलशाही नष्ट केल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात आला व १७०७मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंमहाराज यांच्या अखत्यारीत हे शहर आले. छत्रपती शाहूंनी केलेल्या सनदेनुसार राज्याचा कारभार पेशवे बाळाजी बाजीराव यांच्याकडे आला. त्यानंतर १७५० मध्ये महाराणी ताराबाईंच्या यमाजी शिवदेव नावाच्या सेवकाने सांगोल्याचा किल्ला हस्तगत करून बाळाजीं पेशवे यांच्याविरूद्घ बंड पुकारले पण सदाशिवराव भाऊनी हे बंड उखडुन सांगोल्यावर पुन्हा पेशव्यांची सत्ता स्थापन केली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत (१७९५–१८१८) होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते पुर्णपणे उद्ध्वस्त केले. पेशवाईच्या अस्तानंतर सांगोला इंग्रजी अंमलाखाली आले व सांगोला येथे संपुर्ण महाराष्ट्रातील दुसरी नगरपालिका स्थापन झाली.
© Suresh Nimbalkar
टेंभूर्णी
प्रकार : नगरकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
टेभुर्णी हे सोलापूरच्या माढा तालुक्यातील गाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. मराठा कालखंडात टेंभुर्णीचा मार्ग दळणवळणासाठी वापरला जात असल्याने गावात आदिलशाही निजाम-मराठे यांच्या राजवटीचा इतिहास आजही वीरगळ, सतीशिळा, नागदेवता शिल्पे व टेंभूर्णी कोट यांच्या अवशेष स्वरुपात पहायला मिळतो. उत्तर पेशवेकाळात दुसरे बाजीराव पेशव्यांच्या वतीने टेंभुर्णीतील सदाशिवराव माणकेश्वर यांनी निजामाबरोबरच्या शिष्टाईत त्यांचा प्रभाव निजामावर पाडला. त्यामुळे निजामाने टेंभुर्णी हे गाव त्यांना इनाम म्हणून दिले. भाऊंनी टेंभुर्णीमध्ये १८००च्या सुमारास एक राहता तीन मजली वाडा आणि सैन्य- घोडे यांच्यासाठी एक वाडा असे दोन वाडे व संपूर्ण टेंभुर्णे गावाभोवती तटबंदी बांधली. टेंभुर्णे गावाभोवती संरक्षणासाठी उभारलेली तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक असुन काही ठिकाणी पडझड झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्गाने जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात. पूर्व-पश्चिम असलेला हा कोट चाळीस एकरात पसरलेला असुन बाहेरील तटबंदीत एकुण सोळा बुरूज आहेत. तटबंदीच्या भिंतीची जाडी दहा फुटांपेक्षा जास्त आहे. तटावर चढण्यासाठी आजही शिल्लक असलेल्या तटबंदीत दोन ठिकाणी जिने पाहायला मिळतात. कोटाला प्रवेशासाठी दोन मोठे दरवाजे असुन चार लहान दिंडी दरवाजे आहेत. अकलूज-टेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे दिसणाऱ्या गडाच्या मुख्य दरवाजातुन आत आल्यावर सर्वप्रथम उजवीकडे असणाऱ्या विद्यालयाच्या आवारात दगडी बांधकामातील सुरेख गणेश मंदिर आहे तर डावीकडे महादेव मंदिर दिसते. हा रस्ता कोटातून फिरत दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडत असल्याने या वाटेने गेल्यास सर्व अवशेष व्यवस्थीत पहायला मिळतात. या रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या बाजुस त्याकाळी गडातील वस्तीला पाणीपुरवठा करणारा बामनतळे तलाव दिसतो. असाच एक तलाव गडाच्या बाहेर पश्चिम भागात असुन तो मांगतळे म्हणुन ओळखला जातो. या वाटेने पुढे गेल्यावर दगडी तटबंदी व प्रशस्त आवार असणारे घडीव दगडी बांधकामातील रामाचे मंदिर असून ते मोडकळीस आले आहे. राममंदिर पाहुन पुढे आल्यावर उजव्या बाजुच्या गल्लीत सदाशिवराव माणकेश्वर यांचा वाडा आहे. वाडा मोठया प्रमाणावर मोडकळीस आला असुन आजही तेथे काही लोकांचे वास्तव्य आहे. ब्रिटिश राजवटीतील बाँबे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटमध्ये हा वाडा बांधल्याची नोंद आहे. टेंभुर्णीत उभारलेल्या या वाड्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आमराईतून सायफन पद्धतीने पाणी आणले गेले होते. याचे उच्छवास आजही वाड्याच्या समोर पहायला मिळतात. गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वाड्याला तीन भुयारी मार्ग होते. एक मार्ग पूर्व वेशीत दुसरा मार्ग नरसिंहपूरला तर तिसरा मार्ग आमराईत निघत होता. आमराईत निघणारे भुयार हे भुयार नसुन पाणीपुरवठ्याचा उच्छवास आहे. वाडा पाहुन मुळ वाटेवर आल्यावर थोडे पुढे उजव्या बाजुस प्रचंड प्रमाणात विखुरलेले दगड व ढासळलेले दगडमाती बांधकामातील तीन बुरूज दिसतात. येथे सैनिकांसाठी व घोड्यांसाठी दुसरा वाडा होता व या वाडयाला सहा बुरूज असल्याचे स्थानिक सांगतात. दुसऱ्या वाड्याभोवती कोटाअंतर्गत सहा दगडी बुरुज असल्याने हा बहुदा सैन्य असलेला बालेकिल्ला असावा. यातील उजव्या बाजुच्या बुरुजासमोर गावकऱ्यांनी एक चौथरा बांधून त्यावर कोटात सापडलेली विरगळ, नागशिल्पे, नंदी व इतर दगडी शिल्पे मांडुन ठेवली आहेत. डाव्या बाजुच्या बुरुजासमोर असलेल्या चबुतऱ्यावर सहा मुस्लीम समाधी दिसून येतात. येथे समोरच गडाचा दुसरा मुख्य दरवाजा दिसून येतो. कोटाचा हा दरवाजा इंदापूर वेस म्हणून ओळखला जातो. कोटाचा हा पश्चिमेचा लाकडी दरवाजा व त्यावरील सज्जा आजही शिल्लक असुन त्यावर जाण्यसाठी दोन्ही बाजुच्या बुरूजातून जिना आहे. या दरवाजाच्या आत असणाऱ्या हनुमान मंदिराचा अलीकडेच जिर्णोद्धार केला आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडाच्या या तटबंदीच्या बाहेरील बाजुस एक जुनी विहीर तसेच समोरील ओढा पार करून डाव्या बाजुस एक प्राचीन बारव पहायला मिळते. संपुर्ण कोट फिरायला एक तास पुरेसा होतो. मराठवाडा, सोलापूर, कर्नाटक यांकडील मोहिमांवर जाण्यासाठी टेंभुर्णी मार्गाचा वापर केला गेला आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे लक्ष दक्षिणेकडे केंद्रित केले. इतिहासातील नोंदीप्रमाणे औरंगजेबाचा पुत्र शहाजादा आज्जम मराठ्यांचा पाठलाग करत टेंभुर्णी येथे २ ऑक्टोबर १६८२ रोजी मुक्कामाला थांबला होता. मराठे त्यावेळी भीमा नदीच्या पलीकडे होते. भीमा नदीमुळे मराठे आणि मोगल यांच्या प्रदेशाची विभागणी झाली होती. मराठे संधी मिळताच भीमा ओलांडून मोगलांवर घसरत होते. मराठ्यांच्या फौजा भीमा नदीच्या परिसरात फिरत असल्याची बातमी मिळताच मोगलांचा बक्षी बहरामंदखान १६९०मध्ये काटी परगण्यातून परांडा येथे आला. त्याने त्याचे जड सामान परांड्यास ठेवले आणि तो टेंभुर्णी भागात धावून गेला. गाजीउद्दीनखानही मराठ्यांच्या पाठलागावर तेथे आला होता. तेथे दोघांची गाठ पडली. त्यानंतर बहरांमदखान परत परांड्यास आला. राजाराम महाराज जिंजीतून स्वराज्यात आल्यावर१६९९ मध्ये त्यांनी स्वतः मोगलांविरुद्ध मोहीम उघडली. राजाराम महाराजांच्या मोहिमेची माहिती मिळताच औरंगजेबने शहाजादा आज्जमला महाराजांच्या पाठलागावर लावले. त्याने परांड्याजवळ महाराजांना अडवल्यावर महाराजांनी टेंभुर्णीजवळ येऊन भीमानदी ओलांडून साताऱ्याकडे प्रवास केला. उत्तर पेशवेकाळात टेंभुर्णीतील कीर्तनकार सदाशिवराव भाऊ माणकेश्वर यांच्यामुळे टेंभुर्णी पुन्हा एकदा मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्धीस आले. सदाशिवराव भाऊ माणकेश्वर सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पुण्यास आले व त्यांच्या अंगच्या गुणामुळे लवकरच सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांच्या राजकीय प्रवाहात शिरले. सवाई माधवरावांच्या अकाली मृत्यूनंतर बाजीराव दुसरे पेशवा बनले. सदाशिव माणकेश्वर यांनी दुसऱ्या बाजीरावांचा पक्ष घेतला. बाजीरावांवरील निष्ठेमुळे सदाशिवराव भाऊ बाजीरावाचे निकटवर्तीय बनले. बाजीराव पेशव्यांच्या चुकीच्या धोरणामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला करून शिंदे व पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला व पेशवे वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले. पुढे वसईहून बाजीराव पेशव्यांना इंग्रजांच्या मदतीने गादीवर बसवण्यात माणकेश्वरांनी मोलाची मदत केली. त्यांना बाजीरावाने त्यांचा दिवाण म्हणून नेमले. १८१४-१५ पर्यंत बाजीरावांची भाऊंवर मर्जी राहिली. पुढे सदाशिव माणकेश्वर बाजीरावांच्या मर्जीतून उतरले. मराठी सत्तेच्या अखेरच्या कालखंडात टेंभुर्णीची व्यक्ती मराठेशाहीची सूत्रे सांभाळत होती ही बाब टेंभुर्णीच्या इतिहासात भर घालणारी आहे. मराठेशाहीच्या या कारभाऱ्याचा ८ ऑक्टोबर १८१७ रोजी पुण्यात मृत्यू झाला. सदाशिव माणकेश्वरांच्या मृत्यूनंतर टेंभुर्णीचे ऐतिहासिक महत्त्व ओसरले.
© Suresh Nimbalkar
मागे जा
टेंभुर्णीची गढी - टेंभूर्णीची गढीच्या अस्तित्वाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे, ऐतिहासिक अवशेषांबद्दलची अनास्था या गढीच्या मुळावर उठल्याचे दिसून आले. सदाशिव माणकेश्वर नावाचा कुणी सरदार होता त्याने हि गढी बांधल्याचे सांगतात. गढी मध्ये माणकेश्वरांचा लाकडाचे कोरीव नक्षीकाम असणारा सातमजली वाडा होता आणि तो मालमत्ता वादातून जाळून टाकल्याचे इतिहासकार सांगतात. किल्ल्यात राम आणि विठ्ठलाचे मंदिर असून सध्या ते मोडकळीस आले आहे. रामभक्त हनुमान मंदिर मात्र तंदुरुस्त असल्याचे जाणवते.. किल्ल्यावर बामनतळे आणि मांगतळे.. गतकाळच्या दुर्दैवी जातीयतेची मूर्त उदाहरणे आहेत. अकलूज-टेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे गढीचा मुख्य दरवाजा आणि आत डोकावल्यास डावीकडे बामनतळे नजरेस पडते. तसेच पुणे-सोलापूर महामार्गाकडे जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात.
टेंभुर्णीची गढी
टेंभुर्णी गावाला इतिहासही संपन्न आहे. ते मध्ययुगातील आदिलशाही, निजाम-मराठे यांच्या राजवटीतील अनेक घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे. पंढरपुरच्या आषाढी, कार्तिकी एकादशी वेळी टेंभुर्णीतून जाणाऱ्या हजारो दिंड्यांमुळे गावातील नागरिक विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघतात. गावामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरे, विठ्ठल मंदिर, राम मंदिर, भवानी मंदिर, मसादेवी मंदिर अशी प्रमुख मंदिरे आहेत. सर्व लोक ग्रामदेवतेची यात्रा, नवरात्र उत्सव यांसारख्या धार्मिक उत्सवांत मोठ्या उत्साहाने भाग घेतात. टेंभुर्णीमध्ये वीरगळ, सतीगळ, नागदेवतेची शिल्पे कोरलेले अवशेष पाहण्यास मिळतात.
टेंभुर्णीचा मार्ग मराठा कालखंडात दळणवळणासाठी सातत्याने वापरला गेला आहे. मराठवाडा, सोलापूर, कर्नाटक यांकडील मोहिमांवर जाण्यासाठी टेंभुर्णी मार्गाचा वापर केला गेला आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर, औरंगजेबाने त्याचे लक्ष दक्षिणेकडे केंद्रित केले. औरंगजेबाला तो मराठी सत्ता हां हां म्हणता जिंकून घेऊ शकेल असा फाजील आत्मविश्वास होता. पण त्या नादात त्याला पुढील सत्तावीस वर्षें दख्खन सोडता आले नाही. त्यातच मराठ्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास दडला आहे. मराठे त्यांच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी झगडले तर औरंगजेब साम्राज्यविस्तारासाठी. मराठ्यांची स्वातंत्र्ययुद्धात सरशी झाली. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान टेंभुर्णीचा संदर्भ अनेक वेळेस येतो. इतिहासातील नोंद सांगते, की शहाजादा आज्जम हा औरंगजेबाचा पुत्र मराठ्यांचा पाठलाग करत असता टेंभुर्णी येथे 2 ऑक्टोबर 1682 रोजी मुक्कामाला थांबला होता.
मराठे त्यावेळी भीमा नदीच्या पलीकडे होते. गनिमी युद्धतंत्राच्या प्रभावी वापरामुळे मराठ्यांनी मोगलांना बेहाल केले होते. मराठे आले म्हणून एखाद्या भागात बंदोबस्त लावावा, तर मराठे दुसरीकडेच प्रकट होत! कोठे फौज पाठवावी याचे मोगलांना कोडे पडले होते. मराठ्यांच्या अशा चकवेगिरीमुळे मोगलांची फौज मोठ्या प्रमाणात विभागली गेली होती. भीमा नदीमुळे मराठे आणि मोगल यांच्या प्रदेशाची विभागणी झाली होती. मराठे संधी मिळताच भीमा ओलांडून मोगलांवर घसरत होते. मराठ्यांच्या रात्री-अपरात्रीच्या छाप्यांपासून बचाव व्हावा यासाठी मोगलांना खबरदारी घ्यावी लागत असे. एकदा, मराठ्यांच्या फौजा भीमा नदीच्या परिसरात फिरत असल्याची बातमी मिळताच मोगलांचा बक्षी बहरामंदखान (1690) काटी परगण्यातून परांडा येथे आला. त्याने त्याचे जड सामान परांड्यास ठेवले आणि तो टेंभुर्णी भागात धावून गेला. गाजीउद्दीनखानही (निजाम उल मुल्कचा बाप) मराठ्यांच्या पाठलागावर तेथे आला होता. तेथे दोघांची गाठ पडली. त्यानंतर बहरांमदखान परत परांड्यास आला. मराठ्यांच्या प्रभावी, चपळ युद्धतंत्रापुढे मोगलांची मात्रा चालत नव्हती. त्यामुळे काही मातब्बर सरदारांनाही तोंडावर पडण्याची वेळ आली.राजाराम महाराजांनी जिंजीतून सुखरूपपणे स्वराज्यात आल्यानंतर, 1699 मध्ये मोगलांविरुद्ध मोहीम उघडली. त्यांनी स्वत: वऱ्हाड, खानदेश भागांत मोहीम आखली होती. राजाराम महाराज साताऱ्याहून बाहेरही पडले होते. महाराजांनी स्वत:सोबत सात हजार स्वार; शिवाय धनाजी जाधव, रामचंद्र अमात्य, दादो मल्हार हे मातब्बर सरदार घेतले होते. राजाराम महाराजांच्या मोहिमेची माहिती मिळताच बादशहाने शहाजादा आज्जमच्या मुलाला महाराजांच्या पाठलागावर लावले. त्याने परांड्याजवळ महाराजांना अडवल्यावर महाराजांनी टेंभुर्णीजवळ येऊन भीमानदी ओलांडून साताऱ्याकडे प्रवास केला. महाराजांची योजना बादशहाला कळल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.
उत्तर पेशवेकाळात टेंभुर्णीतील कीर्तनकार सदाशिवराव भाऊ माणकेश्वर यांच्या कर्तृत्वामुळे टेंभुर्णी पुन्हा एकदा मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्धीच्या झोतात आली. भाऊ कीर्तनकार असले तरी तत्कालीन राजकारणाची पुरती जाण असणारे आणि संधीचे सोने करून घेणारे मुत्सदी म्हणून ओळखले गेले. सदाशिवराव भाऊ माणकेश्वर हे सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पुण्यात येऊन ठेपले, ते त्यांच्या अंगी कीर्तनाचे गुण असल्यामुळे. ते पुण्यात लवकरच सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांच्या राजकीय प्रवाहात शिरले. सवाई माधवरावांच्या अकाली मृत्यूनंतर मराठेशाहीतील अस्थिर, अनागोंदीच्या राजकीय पार्श्वभूमीवर बाजीराव दुसरे पेशवा बनले. सदाशिव माणकेश्वर हेही दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कळपात गेले. सत्ताबदलानंतर, भाऊंनी घेतलेला निर्णय योग्य ठरला. त्यांना बाजीरावांवरील निष्ठेमुळे मानाची पदे मिळत गेली. सदाशिवराव भाऊ बाजीरावाचे निकटवर्तीय बनल्याने पेशव्यांनी त्यांना राहण्यासाठी दादा कद्रे यांचा वैभवशाली वाडा दिला. पुढे, सदाशिवराव भाऊंनी स्वत:चा उत्तम वाडा पुण्यातच नाना वाड्याजवळ बांधला. त्याच काळात त्यांच्या हाती प्रत्यक्ष कारभारी म्हणून पेशव्यांचे शिक्के कटारीच आल्या. सदाशिव माणकेश्वर यांना अंबारीचे हत्ती, इजायतीची वस्त्रे 20 मार्च 1801 रोजी झाली. भाऊंनी बाजीरावाने त्यांचा कारभारी म्हणून त्यांची नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करत मोठे अर्थार्जनही केले. पुढे, 1814-15 पर्यंत बाजीरावांची भाऊंवर मर्जी राहिली.
बाजीरावांनी सत्तेवर येताच हैदराबादच्या निजामाबरोबर काही नाजूक कामासाठी सदाशिवरावभाऊंना पाठवले; सोबतीला घोडदळ, पायदळ असा मोठा सरंजाम दिला. निजामाबरोबरच्या शिष्टाईत, सदाशिवरावभाऊंनी त्यांचा प्रभाव निजामावर पाडला. त्यामुळे निजामाने टेंभुर्णी हे गाव त्यांना कायमचे इनाम म्हणून दिले. भाऊंनी त्यांच्या अंगच्या हुशारीमुळे त्यांची प्रगती करून घेतली होती. भाऊंच्या प्रगतीसोबत टेंभुर्णीही प्रकाशझोतात राहिली.
बाजीराव पेशव्यांच्या चुकीच्या धोरणामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला करून शिंदे व पेशवे यांच्या फौजांचा धुव्वा उडवून पेशव्यांना पुण्यातून पळवून लावले होते. पेशवे वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले होते. पुढे, वसईहून बाजीराव पेशव्यांना इंग्रजांच्या मदतीने गादीवर बसवण्यात माणकेश्वरांनी मोलाची मदत केली. त्यांना बाजीरावाने त्यांचा दिवाण म्हणून नेमले. त्यामुळे हत्ती, घोडे, पालखी, चौघडा, सोन्याच्या दांडीची चवरी, सोन्याच्या काठ्या, चोपदारी, पुरी ताजीम, समोर येण असे अनेक बहुमान व मानपान त्यांना मिळाले. पुढे, कित्येक वर्षें भाऊ, बयाजी नाईक व खरशेटजी मोदी यांनी बाजीराव व इंग्रज रेसिडेंट यांच्यामधील मध्यस्थ म्हणून कामकाज पाहिले होते. भाऊ आणि मोदी यांचे सूत जमल्याने दोघांनी एकविचारे राहून लाखो रुपये कमावले. पुढे एल्फिन्स्टनच्या कारकिर्दीत खुद्द एल्फिन्स्टनला देशी भाषा येत असल्याने भाऊंचे मध्यस्थी करण्याचे महत्त्व संपुष्टात आले. त्याच वेळी त्रिंबकजी डेंगळे व मोदी यांचे सूत जमल्याने सदाशिवभाऊ माणकेश्वर बाजीरावांच्या मर्जीतून उतरले. मराठी सत्तेच्या अखेरच्या कालखंडात टेंभुर्णीची प्रभावशाली व्यक्ती मराठेशाहीची सूत्रे सांभाळत होती ही महत्त्वाची बाब टेंभुर्णीच्या इतिहासात भर घालणारी आहे. मराठेशाहीच्या कारभाऱ्याचा 8 ऑक्टोबर 1817 रोजी पुण्यातच मृत्यू झाला. माणकेश्वरांच्या मृत्यूनंतर टेंभुर्णीचे ऐतिहासिक महत्त्व ओसरल्याचे दिसते.भाऊंनी टेंभुर्णीमध्ये दोन वाडे बांधले. तीन मजली वाडा सन 1800 च्या सुमारास बांधला. एक राहता वाडा आणि सैन्य, घोडे यांना राहण्या-उतरण्यासाठी आणखी एक वाडा बांधला. त्याला हवेली असे म्हणत. त्याच्या भोवती सहा दगडी बुरुज होते. ब्रिटिश राजवटीतील बाँबे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटमध्ये वाडा बांधल्याची नोंद आहे. ती अशी - 'The growth of Tembhurni dates from its grant in inam to Sadashiv Mankeshwar who built a fort now much out of repair.' टेंभुर्णीत उभारला गेलेला वाडा हा शनिवारवाड्याप्रमाणे सोयींनी परिपूर्ण होता. वाड्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आमराईतून सायफन पद्धतीने पाणी आणले गेले होते. वाड्याला तीन भुयारी मार्ग होते. एक मार्ग पूर्व वेशीत, दुसरा मार्ग नरसिंहपूरला तर तिसरा मार्ग आमराईत निघत होता. हवेलीच्या बुरुजाचे अवशेष दिसतात. वाड्याचीही पडझड झाली आहे. संपूर्ण टेंभुर्णेभोवती संरक्षणासाठी तटबंदी उभारली गेली होती. पूर्व-पश्चिम दोन्ही दिशांना भव्य वेशी होत्या. पश्चिम वेस इंदापूर वेस म्हणून ओळखली जाते. शिवाय, तटबंदीला सोळा बुरुज, चार खिंडी आहेत. तटबंदीच्या भिंतीची जाडी सुमारे दहा फुटांपेक्षा जास्त आहे. टेंभुर्णीमध्ये तिचे अस्तित्व दिसते, परंतु तेथे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
टेंभूर्णीची गढीच्या अस्तित्वाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे, ऐतिहासिक अवशेषांबद्दलची अनास्था या गढीच्या मुळावर उठल्याचे दिसून आले. सदाशिव माणकेश्वर नावाचा कुणी सरदार होता त्याने हि गढी बांधल्याचे सांगतात. गढी मध्ये माणकेश्वरांचा लाकडाचे कोरीव नक्षीकाम असणारा सातमजली वाडा होता आणि तो मालमत्ता वादातून जाळून टाकल्याचे इतिहासकार सांगतात. किल्ल्यात राम आणि विठ्ठलाचे मंदिर असून सध्या ते मोडकळीस आले आहे. रामभक्त हनुमान मंदिर मात्र तंदुरुस्त असल्याचे जाणवते.. किल्ल्यावर बामनतळे आणि मांगतळे.. गतकाळच्या दुर्दैवी जातीयतेची मूर्त उदाहरणे आहेत. अकलूज-टेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे गढीचा मुख्य दरवाजा आणि आत डोकावल्यास डावीकडे बामनतळे नजरेस पडते. तसेच पुणे-सोलापूर महामार्गाकडे जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात.
एतिहासिक खाणाखुणा जपलेल नातेपुते
आपल्या महाराष्ट्र राज्याच्या काना-कोपऱ्यात भटकंती करताना आजही अशी अनेक गावे, अनेक ठिकाणे सापडतील जी आधुनिकीकरणाच्या युगातही आपले आपले प्राचीनत्व टिकवून आहेत. असेच एक छोटेखानी गाव आहे सोलापूर जिल्ह्यातील, माळशिरस तालुक्यातील – नातेपुते. पुणे-पंढरपूर महामार्गावरील फलटण शहरापासून सुमारे ४० किमीवर नातेपुते वसले आहे. सातारा शहरापासून जायचे असल्यास शिखर शिंगणापूर ओलांडून पुढे केवळ १५ किमीवर प्रवास करून नातेपुते गाठता येते.
नातेपुते गावाचा इतिहास पाहता ह्या गावाचे पुरातन नाव नर्तकीपुर होते असे आढळते. नन्तरच्या काळामध्ये ह्याचे अपभ्रंश होऊन नातेपुते नाव अडले असावे. आधीच्या काळी संपूर्ण गाव तटबंदी-बुरुजाच्या भरभक्कम संरक्षणामध्ये वसलं होत. तटबंदीच्या परकोटाची आतमध्ये एक मुख्य कोट होता जिथे पंचक्रोशीच्या सर्व कारभाराची मुख्य कचेरी होती. आजमितीस नातेपुते गावात फेरफटका मारताना ह्या मुख्य कोटाचा केवळ एकमेव बुरुज पाहायला मिळतो. मात्र गावामध्ये भटकताना अनेक ठिकाणी पुरातन दगडी बांधकामाच्या भिंती, पुरातन जलसाठे, घरांच्या पायाचे जोते आढळतात. मात्र नातेपुते गावाचे खरे प्राचीनत्व सिद्ध करतात येथील दोन हेमाडपंथी शैलीतील मंदिरे. महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन कालखंडात सुमारे तेराव्या शतकात, यादव साम्राज्याच्या काळामध्ये हेमाडपंथी वास्तुशैलीचा उगम झाला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे हेमाडपंथी वास्तुशैलीतील मंदिरे आढळतात निश्चितच ती ठिकाणे फार पुरातन म्हणता येतील. नातेपुते गावामध्ये अशीच दोन हेमाडपंथी मंदिरे आहेत, गिरिजापती मंदिर आणि बळीचे मंदिर. तसेच ह्या मंदिराच्या जोडीने गावामध्ये अनेक वीरगळी देखील आढळून येतात. हि सर्व प्रमाणे सिद्ध करतात कि एकेकाळी नातेपुते हि वीरांची भूमी देखील होती.
नातेपुते पासून सुमारे १५ किमीवर असलेले शिखर शिंगणापूर मंदिर तर सर्वन्यात आहेच. कारण हे आहे शिव-पार्वतीचे विवाहस्थळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत. मात्र फार कमी लोकांना हे माहित असेल कि नातेपुते हे पार्वतीचे माहेर आहे. शिव-पार्वतीच्या मिलनाची कथा आजही आपल्या येथील स्थानिक लोकसाहित्याच्या ओव्यांमधून ऐकायला मिळते
आल्याड नातंपुतं, पल्याड शिंगणापूर |
दवण्यासाठी गेला, भोळा शंकर दूर ||
वाजत्याती वाजांतरी, नात्यापुत्याच्या लवनी |
भोळ्या शंभू महादेवाचं गेलं लगीन लागुनी ||
दवणा नावाची एक सुंगंधी व औषधी वनस्पती ह्या भागात आढळते. वरील ओव्यांनुसार, ह्याच दवणा वनस्पतीच्या शोधार्थ शिवशंकर कैलासावरून नातेपुते परिसरामध्ये आले आणि इथे त्यांना देवी पार्वती दिसली. नन्तर ह्या दोघांचे शिखर शिंगणापूरला लग्न लावण्यात आले. पार्वतीचे माहेरचे नाव होते गिरीजा, म्हणून नातेपुते गावामध्ये असलेल्या शिवमंदिराला गिरिजापती मंदिर म्हणतात. तसेच पार्वतीचा भाऊ बळियाप्पा याचे मंदिर देखील गिरिजापती मंदिराच्या जवळच आहे. हि दोन्ही मंदिरे पुरातन हेमाडपंथी शैलीतील आहेत.
गिरिजापती मंदिर तुलनेने जास्त मोठे प्रशस्त असून मंदिराला चहुबाजूने भक्कम तटबंदी आहे. मंदिराला तीन मुख्य प्रवेशद्वारे आहेत. मंदिर प्रांगणात प्रवेश करताच तीन उंच दीपमाळा आपले स्वागत करतात. भरभक्कम दगडी खांब असलेला सभामंड्प, सभामंडपामध्ये विराजमान असलेला नन्दी आणि मुख्य देव-गाभारा अशी मंदिराची बांधणी आहे. मंदिरच्या शिखराची नव्याने बांधणीकेली असून सुंदर रंगकाम केले आढळते. मंदिराच्या आसपास काही पुरातन मुर्त्या देखील ठेवल्या आहेत. त्यामध्ये पार्वतीला मांडीवर घेऊन बसलेली शिवमूर्ती म्हणजे गौरीहराची मूर्ती, महिषासुरमर्दिनी आणि दुर्मिळ अशी चतुरलिंगी शिवपिंड अवश्य बघावी.
मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यावर एक शिलालेख कोरलेला आढळतो. त्या शिलालेखामध्ये शके १७८४ च्या श्रावण महिन्याचा उल्लेख आहे. ह्या काळामध्ये मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम झाले असावे. मुख्य गाभाऱ्यामध्ये चौकोनी शिवपिंडीवर शिवलिंगाऐवजी दोन शाळुंका आहेत ज्या शिव-पार्वतीचे स्थान दर्शवतात. मंदिराच्या बाहेर अनेक वीरगळी भग्नावस्थेत पडलेल्या आहेत, तसेच एक सतीशिळा देखील आढळते. स्थानिक लोकांनी ह्या वीरगळींचे आणि सतीशीळेचे योग्य जतन करून मंदिर आवारात ठेवायला हवे.
गिरिजापती मंदिराच्या जवळच आहे पार्वतीचा भाऊ बळियाप्पा म्हणजेच बळी मंदिर. हे मंदिर तुलनेने छोटे असून मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रथम शनी व हनुमानाची मूर्तीचे दर्शन होते. इथेही छोटेखानी सभामंड्प आणि गाभारा अशी रचना आढळते.
बळी मंदिराच्या बाहेरही दोन वीरगळी अर्ध्या जमिनीमध्ये गाडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. ह्या दोन हेमाडपंथी पुरातन मन्दिराखेरीज नातेपुते गावातील आवर्जून बघावे असे अजून एक मंदिर म्हणजे पर्वतेश्वर मंदिर. एका छोट्या टेकाडावर बांधलेले हे शिवमंदिर सुमारे शंभर वर्षापूर्वीचे असावे. मंदिरापर्यंत जायला उत्तम पायरीमार्ग आहे. कमानींमधून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूला पुरातन देवड्या दिसतात आणि दोन उंच दीपमाळा देखील आहेत. मंदिराचा सभामंड्प लाकडी खांबांवर बांधलेला असून गाभाऱ्यामध्ये शाळुंका असलेली शिवपिंड आहे.
पर्वतेश्वर मंदिराच्या आवारामध्ये दोन सुंदर सुस्थितीतील वीरगळी आहेत. त्यापैकी एक आहे द्वंद्वयुद्ध वीरगळ आणि एक आहे गोधन रक्षण वीरगळ. तसेच स्थानिक लोकांकडून असे सांगितले जाते कि पर्वतेश्वर मंदिराच्या मागील बाजूने एक भुयारी मार्ग होता जो थेट शिखर शिंगणापूर मंदिराकडे जात असे. मात्र सध्या हा भूयारी मार्ग बुजवलेला आढळतो.
हाताशी पुरेसा वेळ असेल नातेपुते पासून साधारण ४० किमीवर अंतरावर असलेल्या वेळापूर गावातील अर्धनारी नटेश्वरह्या पुरातन शिवमंदिराला देखील भेट देता येईल. तसेच जर दोन-तीन दिवसांचे उत्तम नियोजन केले आणि स्वतःचे वाहन असेल तर नातेपुतेच्या जवळपास आपल्याला अनेक किल्ल्यांची भटकंती देखील करता येईल. सातारा जिल्ह्यातील संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले नातेपुते पासून पहाटे लवकर निघून एका दिवसात बघता येऊ शकतात. तसेच सोलापूर जिल्ह्यातील पिलीव आणि अकलूज येथील सुंदर भुईकोट किल्लेहि पाहता येथील. यापैकी अकलूजच्या किल्ल्यामध्ये उभारलेली शिवसृष्टी तर प्रत्येक इतिहासप्रेमीने अवश्य पाहावी.
पुणे-सातारा शहरापासून जर तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार अशी एक दिवसीय छोटी, शांत, निवांत अशी सहल आयोजित करायची असेल तर नातेपुते आणि परिसर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एखाद्या आधीच प्रसिद्ध असलेल्या गजबजलेल्या, गर्दीच्या ठिकाणी सहलीला जाण्याऐवजी कधीतरी वाकडी वाट करून अशा आडवाटेवरील कमी विख्यात जागेला देखील भेट द्यावी. खास करून दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी व्यक्तींनी तसेच ज्यांना पुरातन मंदिरे, वीरगळी, स्मारके बघायची आवड असेल त्यांना तर नातेपुते परिसरातील मंदिरे आणि किल्ले म्हणजे एक उत्तम पर्वणी ठरेल.
अक्कलकोट
अक्कलकोटचे संस्थान छत्रपती शाहू महाराजांच्या साताऱ्याच्या गादीबरोबर आकारास आले. राजे फत्तेसिंह भोसले हे शाहूंचे मानसपुत्र. ते या संस्थानचे पहिले राजे! ती गोष्ट १७०७ सालची. पुढे १८९६ ते १९२३ मध्ये फत्तेसिंह भोसले (तिसरे) हे राजे होऊन गेले. त्यांचे कर्तृत्व अलौकिक आणि त्यांची दृष्टी असामान्य. त्या राजाच्या काळातच अक्कलकोटचा नवा राजवाडा आणि त्यांचे शस्त्रागार उभे राहिले.
त्यांचा नवा राजवाडा म्हणजे लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसची प्रतिकृती; तीसुद्धा सोलापूरजवळच्या अक्कलकोट शहरात! वर्तमानात वाटणारी ती विसंगती राजवाड्याच्या अवशेषांच्या रूपाने इतिहासातील ते वैभव आपल्या समोर उभे करू शकले.
त्या राजवाड्याचे बांधकाम १९१० साली सुरू झाले. ते पुढे तब्बल तेरा वर्षांनी, १९२३ साली पूर्ण झाले. तो राजवाडा त्याच्या भव्यतेने दीपवून टाकतो. तो पाश्चात्य शैलीत आहे. तो अष्टकोनी, तीन मजले उंच आहे. असंख्य खोल्या, दालने, स्तंभ-कमानीच्या रचना आणि त्या साऱ्यावर चार मजली उंच घड्याळाचा मनोरा. तेथील या मातीत ते सारे चित्र अद्भुत वाटते. वाड्याच्या दर्शनी भागावर अक्कलकोट संस्थानचे राजचिन्ह आहे आणि त्याखाली ‘सत्यमेव जयते’ ही त्यांची राजमुद्राही आहे. आपल्या देशाचे म्हणून वापरात असलेले ते बोधवाक्य कधीकाळी अक्कलकोट संस्थान होते!
राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावर शस्त्रागार आहे. राजे फत्तेसिंह भोसले (तिसरे) यांना वेगवेगळी शस्त्रे जमवण्याचा छंद होता. त्यांना अवघे अठ्ठावीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी रणांगणावरील पराक्रम गाजवलाच तो पराक्रम गाजवणारी पण त्याबरोबर असंख्य शस्त्रेही जमवली. त्या संग्रहातून अक्कलकोटचे हे शस्त्रागार १९२२ साली आकाराला आले. सुरुवातीची अनेक वर्षे संग्रहालय अक्कलकोटचा जुन्या किल्लेवजा राजवाड्यात होते, ते सुरक्षिततेच्या कारणास्तव २००२ मध्ये नव्या राजवाड्यात हलवण्यात आले. अकराशे तलवारी, दोनशेहून अधिक बंदुका, तेवीस लहानमोठ्या तोफा, बावन्न पिस्तुले; तसेच, कट्यार, गुप्ती, बिचवे, खंजीर, भाले, परशू, अंकुश, वाघनखे, बाण आणि आणखी कितीतरी... त्या हत्यारांचे वैविध्य आणि संख्याबळच प्रेक्षकाचे डोळे दिपवून टाकते. ते आशियातील मानाचे शस्त्र संग्रहालय मानले जाते.
कट्यारी, बिचवे, कुकरी, कोयते, भाले, बाण, गुप्ती, अंकुश, परशू अशी शत्रूच्या रक्ताला चटावलेली हत्यारे एकेक करत पुढे येऊ लागतात. अचानक उघडणारी दुधारी कट्यार, शत्रूवर फेकले जाणारे सुरे, वेध घेणारे बाण, धावत्या घोड्यावरून मारा करण्याचे भाले, हत्तीवरील ‘अंकुश’, जडावातील खंजीर-कट्यारी असा सारा हत्यारांचा मामला प्रेक्षकास सामोरा येऊ लागतो. त्यांच्या अधे-मधे बचाव करणारी चिलखते, शिरस्त्राण, जिरेटोप, अंगरखा आणि त्या ढाली यांचे सुरक्षाकवचही दिसते.
हत्यारांची दालने जातात आणि पुढच्या दालनात हत्यारांनीच वेध घेतलेल्या शिकारी प्रेक्षकास दिसू लागतात. वाघ, बिबटे, अस्वल, गवा, तरस, रानडुक्कर आणि तेथील सांगवी तलावातील मगरी... या शिकारी तेथे पेंढा भरून ठेवलेल्या आहेत.
शिकारीनंतंरच्या पुढच्या काही दालनांमधून बंदूक-तोफांचे आवाज निघू लागतात. देशी-विदेशी, इतिहास-वर्तमानातील अशा असंख्य बंदुका त्यांची उत्क्रांतीची कथा सांगू लागतात. ठासणी, तोड्या, केप, रायफली, किराबीन, पिस्तूल, संगिनी अशा वेगवेगळ्या जातींच्या बंदुका, प्रत्येकीचा आकार, रंग-रूप आणि सावज निराळ्या टप्प्यांतील. तळहातावर बसेल अशा पिस्तुलापासून ते बारा फूट लांबीच्या बंदुकीपर्यंतचा तो सारा प्रवास! पंचधातूच्या, उखळी, छोट्या-मोठ्या आकारातील तोफा आणि पहिल्या महायुद्धात वापरलेल्या मशिनगन्स देखील तेथे दिसतात.
संग्रहालयात ऐतिहासिक भांडी, मौल्यवान-शोभेच्या वस्तू, खेळणी असा अन्य संग्रहही आहे. संस्थानच्या राजांची तैलचित्रे आहेत. सर्वत्र दिसणाऱ्या सिंहासनाऐवजी हत्तीच्या पायापासून बनवलेले आगळेवेगळे ‘गजासन’ तेथे आहे. अक्कलकोट संस्थानच्या वंशजांकडून त्या साऱ्या ऐतिहासिक ठेव्याचे पिढ्यान् पिढ्या जतन केले जात आहे. सध्या ती जबाबदारी श्रीमंत राजकुमारी संयुक्ताराजे भोसले आणि श्रीमंत राजकुमारी सुनीताराजे भोसले पार पाडत आहेत.
ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू या त्या त्या काळा-वेळाचे दर्शन घडवतात. कधी काळी बांधलेला हा अक्कलकोटचा राजवाडा आणि त्यातली ही जुनी ऐतिहासिक हत्यारे पाहताना हाच अनुभव येतो. शस्त्रांचा हा खणखणाट सतराव्या शतकातील रणभूमीवर घेऊन जातो. यामुळे श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाने भक्तिरसात बुडालेले मन शस्त्रागारातून बघताना इतिहासातही चिंब भिजून जाते.
(अक्कलकोट शस्त्रागार - अक्कलकोट, सोलापूर. हे संग्रहालय आठवड्यातील सर्व दिवस नाममात्र दरात खुले आहे. संपर्क दूरध्वनी : ०२१८१-२२०२२३)
संस्थांचे पहिले नरेश

श्रीमंत फत्तेसिंह महाराज | अक्कलकोट संस्थांचे पहिले नरेश
छत्रपती शाहूंचे मानसपुत्र असलेल्या फत्तेसिंह भोसले यांचा जन्म सन १६९८ साली झाला. यांचे मूळ आडनाव लोखंडे, औरंगाबाद परिसरस्थित शाहूंच्या सैन्यावर सयाजी लोखंडे यांनी हल्ला केला, याच्या प्रतिकारात सयाजी लोखंडे मारले गेले. तेव्हा सयाजी लोखंडेच्या पत्नीने आपले तान्हं पोरं शाहूंच्या पायी घातले. शाहूंच्या महाराष्ट्रामधील आगमनादरम्यान झालेल्या पहिल्या लढाईच्या काळातील हा प्रसंग., पहिलीचं फतेह म्हणून या पुत्राचे नाव फत्तेसिंह ठेवले असेही उल्लेख फत्तेसिंह यांच्या नावाविषयी आढळतात. १७१२ साली शाहूंनी त्यांना सातारा येथे आणले व स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचे पालनपोषण केले.साताऱ्यातील वाड्यात यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. शाहूंच्या पत्नी विरुबाई यांचे फत्तेसिंहांवर जिवापाड प्रेम, अगदी पोटच्या पोराप्रमाणे, आणि तेवढ्याचं लाडात आणि उच्च व्यवस्थेत त्यांनी फत्तेसिहांना वाढविले. विरुबाईंच्या मृत्यूपश्चात त्यांचे उत्तरकार्य देखील फतेसिहांनी पार पाडले. यामुळेचं विरुबाई यांच्या नावे असणारी अक्कलकोट प्रांताची जहागीर फत्तेसिंह यांच्यानावे बहाल करण्यात आली.
कर्तबगार, कार्यधुरंदर आणि शाहूंचे मानसपुत्र असल्यामुळे फत्तेहसिहांना दरबारात विशेष मान होता.शिवरायांची राजधानी आणि मराठ्यांचे तख्त असलेला ‘रायगड‘ आणि जिजाऊ राहत होत्या ते पाचाड १६८९ पासून म्हणजे ४४ वर्षे पारतंत्र्यात होते, तेव्हा फत्तेसिंह भोसले आणि प्रतिनिधी यांनी रायगडला वेढे दिले, मराठ्यांनी सिद्दीचा एक मुलगा आणि एक सेखजी नावाचा सरदार आपल्या बाजूने आणला होता, त्यांना पुढे करून रायगड फंदफितुरीने घेण्याचे प्रयत्न होते. प्रयत्नास यश येऊन ६ जून म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकदिनीच रायगड वर भगवा फडकला. या कामगिरीबद्दल फत्तेसिंह भोसले यांच्या पराक्रमाचा छत्रपती शाहूंनी एका पत्रात विशेष उल्लेख केला.
१७२५ साली झालेल्या दक्षिणेतील स्वारीची संपूर्ण जवाबदारी शाहूंनी फत्तेसिंह यांच्यावर सोपविली होती., याच काळात ते तंजावरच्या छत्रपतींना भेटल्याच्यासुद्धा नोंदी आढळतात. १७३७ साली जेव्हा दक्षिणेत विशेष करून कर्नाटकवर जी स्वारी झाली यात मराठ्यांना घवघवीत यश मिळाले याच नेतृत्व फत्तेसिंह भोसले हेच करत होते, अनेक मोहिमांमध्ये, अनेक विषयांमध्ये अग्रणी असणारे फत्तेसिंह १५ डिसेंबर १७४९ नंतर म्हणजे छत्रपती शाहूयांच्या मृत्यूनंतर अक्कलकोट, आपल्या जाहगिरीत राहावयास गेले. अक्कलकोटच्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांचे वास्तव्य होते. अशा या शाहूंच्या पराक्रमी पुत्राचे २० जानेवारी १७६० रोजी निधन झाले
अक्कलकोट रस्त्याच्या अगदी शेजारीचं दिसणारी तटबंदी म्हणजे अक्कलकोटचा भुईकोट किल्ला होय
पहिला फोटो फत्तेसिंह भोसले यांचा
दुसरा फोटो म्हणजे फत्तेसिंह भोसले यांचे समाधीस्थळ
तिसरा फोटो म्हणजे अक्कलकोट संस्थानचा नवा राजवाडा

































































































































1.jpg)
5.jpg)
6.jpg)
8.jpg)
9.jpg)
10.jpg)
11.jpg)
12.jpg)
13.jpg)
































































































































































No comments:
Post a Comment