दख्खनच्या पठारावरील , महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे असणाऱ्या अहमदनगर या ऐतिहासिक जिल्ह्यातील नेवासा हे एक तालुक्याचे गाव आहे . ते अहमदनगर शहराच्या ईशान्येस सु. ६० किमी. अंतरावर प्रवरा नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे. उत्तर तीरावरील नेवासा हे बुद्रुक म्हणून, तर दक्षिण तीरावरील नेवासा हे खुर्द म्हणून ओळखले जाते. संत ज्ञानेश्वरांनी येथे ज्ञानेश्वरी लिहिल्याचा उल्लेख संत परंपरेमध्ये असल्याने हे गाव विशेष प्रसिद्ध आहे.. तालुक्याचा विस्तार १ ९ : १ ९ ते १ ९ ४० उत्तर अक्षांश व ७४ ° ४८ ते ७५ ११ पूर्व रेखांशावर असून पूर्वेला शेवगाव , पश्चिमेकडे राहुरी , श्रीरामपूर , दक्षिणेकडे नगर , पाथर्डी हे तालुके ; आणि उत्तरेकडे औरंगाबाद जिल्ह्याची हद्द , म्हणजेच गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे . तालुक्याच्या चतुःसीमा अशा आहेत . रचना : नेवासा तालुका हा साधारणतः मैदानी भाग असून त्याचा उतार गोदावरी नदीकडे आहे . समुद्रसपाटीपासूनची उंची ४५० ते ५७० मीटरपर्यंत आहे . तालुक्याच्या नैऋत्येकडील भाग जास्त उंचीचा असून तो ‘ अहमदनगर ’ डोंगररांगेचा आहे . दक्षिणेकडील भाग विखंडित टेकड्यांचा आहे . त्याच भागातून अनेक लहान ओढे , नाले , ओहोळ उगम पावतात आणि उत्तरेकडे वाहत जाऊन गोदावरीच्या अनेक उपप्रवाहांत मिळतात . जलप्रणाली : नेवासे तालुक्यामध्ये जलप्रणाली उत्तर दिशेने म्हणजे गोदावरी नदीच्या दिशेने आढळते . गोदावरी नदी ही अहमदनगर जिल्ह्याचीदेखील उत्तर व ईशान्य बाजूने सीमा आहे . गोदावरी नदीच्या पलीकडच्या तीरापासून औरंगाबाद जिल्ह्याची हद्द सुरू होते . गोदावरी नदीचे पात्र सभोवतालच्या प्रदेशापेक्षा सुमारे सहा ते बारा मीटरपर्यंत खोल आहे . ह्या भागातील गोदावरी पश्चिमेच्या बाजूने ती तालुक्यात उपनदी प्रवरा असून , नदीची मुख्य नेवाशापासून सात किलोमीटर अंतरावर प्रवेश करते . गोदावरी नदीशी प्रवरेचा ज्या ठिकाणी संगम होतो ते गाव म्हणजे कायगाव टोका होय . मात्र पैठणजवळ जायकवाडी येथे ' नाथसागर जलाशयाचे सुमारे वीस लक्ष घनमीटर क्षमता असलेले धरण झाल्याने नेवासे व गंगापूर तालुक्यांतील अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागले . धरणाचा बॅक वॉटर फ्लो थेट नगर - औरंगाबाद राजमार्गाप येतो . त्यामुळे त्या गावाला प्रवरासंगम असे नाव आहे . लेडगा व पानस दुय्यम स्वरूपाच्या नद्या होते . त्याच्यामुळे पश्चिम व दक्षिण भागातील जलप्रणाली तयार झाली आहे . त्या दुय्यम नयाचा उगम दक्षिणेकडील अहमदनगर डोंगररांगांमध्ये झाला आहे.

नेवासा येथील सांस्कृतिक क्रम दर्शविणारी प्रतिकृती, डेक्कन कॉलेज, पुणे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे माजी महानिदेशक एम. एन. देशपांडे यांनी गोदावरी – प्रवरा नदीच्या खोऱ्यातील ताम्रपाषाणयुगीन स्थळांच्या गवेषणा दरम्यान या स्थळाचा शोध लावला (१९५४-५५). पुढे या स्थळाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी डेक्कन कॉलेज, पुणे तर्फे पुरातत्त्वज्ञ ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली येथील लाडमोड टेकडी येथे उत्खनन करण्यात आले (१९५४-६०). सदर उत्खननातून प्रागैतिहासिक काळ, उत्तर पुराश्म काळ, मध्य पुराश्म, ताम्रपाषाण युग नंतर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, रोमन कालखंड, बहमनी कालखंड अशा विविध कालखंडांतील संस्कृतींचे अवशेष दिसून आले. ताम्रपाषाण युगानंतर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडापर्यंतच्या एका दीर्घ काळाचे मात्र येथे कोणतेही अवशेष दिसून आले नाहीत.
उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड म्हणजेच इ. स. पू. १५० ते इ. स. २०० या काळातील विविध स्तरांतून त्या त्या काळचे सांस्कृतिक जीवन दिसून आले. पहिला कालखंड हा सातवाहन राजघराण्याशी समकालीन होता, ज्यामध्ये सारवलेली जमीन, विटा, विविध प्रकारची मृद्भांडी आणि अलंकार, हत्यारे यांचा वापर दिसून आला. ताम्रपाषाण काळानंतर असलेल्या प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाचे अवशेष हे रसेट कोटेड (लाल रंग आणि बाहेरील बाजूस पिवळसर रंगात फुलांची नक्षी), पोलादी निळसर रंगाची चमक (एन.बी.पी.डब्ल्यू.) असलेली अशी भांडी, काळी आणि तांबडी मृद्भांडी, जाड काठ असलेली तांबड्या रंगाची मृद्भांडी अशा प्रकारच्या विविध मृद्भांड्यांच्या स्वरूपात आढळले. तसेच मातीपासून बनवण्यात आलेली विविध खेळणी, माणसांच्या विविध प्रतिकृती त्या वेळच्या सांस्कृतिक आणि सामजिक बाबी दर्शवतात. मातीपासूनच बनवण्यात आलेला चैत्य हा फार महत्त्वाचा सांस्कृतिक पुरावा आपल्याला दिसून येतो.
सदर कालखंडामध्ये बांधण्यात आलेली घरे ही एका पेक्षा अनेक खोल्या असणारी होती हे निदर्शनास आले. नेवासा मध्ये ४६४५.१५ चौ. मी. एवढ्या मोठ्या विभागात अशी वस्ती असावी, असे मिळालेल्या अवशेषांवरून दिसून येते. ही घरे पक्क्या आणि मोठ्या विटांची बांधलेली अशी होती. घरांच्या दाराची रुंदी ७६.२ सेंमी. होती. दाराची लाकडी चौकट खोबणीत बसवून लाकडी दारे लोखंडी बिजागऱ्यांनी पक्की करीत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कूपाची सोय करण्यात आलेली होती. अशा कूपात फुटकी खापरे, सडलेले अन्न आणि इतर वस्तू सापडल्या. तसेच येथील उत्खननात याच स्तरावर जळलेले गहू, हरभरा, बाजरी, मूग, रागी ही धान्ये सापडली, ज्यावरून मांसाहाराबरोबरच शाकाहार सुद्धा या काळात केला जाई, हे दिसून आले. याच स्तरावर अगदी मोजकी अशी आहत नाणी (Punch marked coins), तसेच साच्यात ओतून बनवलेली कोणताही लेख नसलेली अशी टंकित नाणी आढळली. सातवाहन घराण्यातील राजा श्री सातकर्णी किंवा सिरी सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी यांची नाणी मिळाली असल्याने कालखंडाची निश्चिती करणे सोपे झाले.

मातीचा चैत्य, नेवासा.
या कालखंडामध्ये माणूस लोखंड आणि तांबे ह्या धातूंचा विविध हत्यारे आणि उपकरणे बनविण्यासाठी जास्त वापर करत असावा. तांबे धातूपासून बनवलेली सळई, बाणांची टोके, भाल्यांची टोके, धार असलेली पाती, नोकहत्यार (point) आणि अंगठ्या, तसेच लोखंडापासून तयार केलेली बाणांची टोके, पाती, सुरे, काही भांडी इत्यादी अवशेष आढळून आले. याचबरोबर हस्तिदंतापासून बनवलेला कंगवा, प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेली अंगठी, गळ्यातील आभूषणे उत्खननात आढळली.
सातवाहन कालखंडानंतर वरच्या स्तरावर इंडो-रोमन काळातील (इ. स. ५० ते २००) रोमन बनावटीच्या अनेक वस्तू येथे आढळून आल्या. त्या काळात होत असणाऱ्या व्यापारामुळे नेवासा गावातील लोकांच्या वापरात रोमन बनावटीच्या वस्तू वापरात होत्या. त्यामध्ये रोमन काचेचे मणी, रोमन पुतळे आणि अर्चना कुंडे, चार पायांची जाती या गोष्टी प्रामुख्याने होत्या. यांबरोबरच अनेक रोमन बनावटीची मृद्भांडी आढळून आली, ज्यांमध्ये लाल चकाकी असलेली (Red polished ware), काळ्या रंगाची रूलेटेड मृद्भांडी (Rouletted ware), लाल रंगाची सुबक बनावटीची आणि चाकावर घडवलेली मेगारॉन (Megaron ware) मृद्भांडी यांचा समावेश होतो. तसेच १२१.९२ सेंमी. उंचीचा अॅम्फोरा (मद्य किंवा ऑलिव्ह तेल साठवणीचा कुंभ) आढळून आला. सदर कुंभ नलिका कृती उदराचा, निमुळत्या बुडाचा, मानेला दोन्ही बाजूंनी हस्तमूठ (Handle) असलेला व गोल तोंडाचा होता. या कुंभातून भारतात समुद्रमार्गे जहाजातून रोमन मद्य आयात केले जाई. या मृद्भांड्यासोबत मध्ये टोकदार उंचवटा असलेली तांब्याची एक संपूर्ण थाळी येथे सापडली. सर्व मृद्भांडी इ. स. पू. पहिले ते इ. स. पहिले शतक या कालखंडात बनवली जात असावीत. मृद्भांडी चाकावर बनवलेली आणि उत्कृष्ट प्रतीची, सुबक बनावटीची, बहुतांश वेळा बाहेरील बाजूस नक्षीकाम केलेली असत.
सातवाहन घराण्यातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी आणि यज्ञश्री सातकर्णी यांची मिळालेली नाणी सातवाहन घराण्याचा इतिहास समजून घेण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला पुरावा आहे. या नाण्यांच्या बरोबरीने नंतरच्या काळात गळ्यात घालण्याचे गोल आकाराचे मोठे अलंकार (roman bullae) आढळले होते. हे अलंकार सोने किंवा शिसे या धातूंपासून किंवा भाजलेल्या मातीपासून तयार केलेले असत. रोमन राजा ऑगस्टस याच्या नाण्यांवर असणारे चित्रांकन येथील गळ्यातील अलंकारावर दिसून आले. शिवाय येथील उत्खननात एकाच रंगात रंगवलेल्या काचेच्या बांगड्या, शंखाचे अलंकार, हस्तिदंतापासून बनवलेल्या बांगड्या, मातृदेवतेच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती सापडल्या.
येथे मिळालेल्या अवशेषांवरून हे शहर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील एक महत्त्वाचे असे सामाजिक, आर्थिक केंद्र असल्याचे लक्षात येते. नेवाशाची भरभराट इसवी सनपूर्व तिसरं शतक ते पहिलं शतक या काळात झाली ; नेवाशाचा बाह्य जगताशी , अगदी रोमन साम्राज्यांतर्गत प्रदेशापर्यंत संबंध आला . वारकरी संप्रदाय व महानुभाव पंथ नेवाशाच्या पंचक्रोशीत इतिहासकाळात एकाच वेळी नांदले . तेव्हा तेथे साहित्यिक व सांस्कृतिक क्रांतीच घडून आली ! नेवासा हे ज्ञान , ध्यान , कर्म व भक्ती यांचे विद्यापीठ बनले.
ऐतिहासिक वारसा अगस्त्य ऊर्फ अगस्ती ऋषी हे महाराष्ट्रीयांचे मूळ ज्ञात पूर्वज मानले . जातात . महाराष्ट्र हा दगडधोंड्यांचा देश असून ' महाराष्ट्र ' या देशनामाचा अतिप्राचीन , स्पष्ट उल्लेख ' महावंश ' या बौद्ध ग्रंथात सापडतो , हे नाव इसवी सन ५०० च्या आसपास प्रचलित झाले असावे . आर्य आणि द्रविड यांचा संयोग हे महाराष्ट्रातील पहिले मोठे स्थित्यंतर आहे . त्यामुळे महाराष्ट्राची निर्मिती व संस्कृती उदयास आली . मराठी भाषेतील जुन्यातला जुना असा शिलालेख म्हैसूरजवळील श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली १११६ नंतर कोरला गेलेला आढळतो .
त्रिभुवनैक पवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र || जेथ जगाचे जीवनसूत्र । श्री महालया असे ॥ तेथ यदुवंश विलासु । जो सकळकळानिवासु ॥ न्यायाते पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥ ज्ञानेश्वरी , अध्याय १८ , ओवी १८०३-०४ प्राचीन काळी देवदैत्यांनी समुद्रमंधन केले असे आपण ऐकतो आणि वाचतो ... तारकासुराने वर मिळवला आणि तो एवढा उन्मत्त झाला , की त्याने स्वर्गावर हल्ला केला . अप्सरांच्या नर्तनात रममाण झालेल्या इंद्राकडून देवगुरूंची अवहेलना , हेळसांड झाली होती . त्यामुळे त्यांनी दिलेल्या शापामुळे इंद्र दुबळा बनला होता . अशातच तारकासुराने स्वर्ग जिंकून सर्व देवतांना हाकलून लावले . तेव्हा श्री विष्णूंनी पृथ्वीवर स्वर्ग वसवण्यासाठी योग्य स्थळाचा शोध घेतला . त्याच ठिकाणी काही काळ स्वर्गातील सर्व देवदेवता वास्तव्य करून होते . कुबेरही आपला ' नवनिधी ' नवा खजिना घेऊन पृथ्वीवर आला . अशा देवदेवतांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले , ते ठिकाण म्हणजेच ' महालय ' किंवा कुबेराचा ' निधी ' ज्या ठिकाणी ' निवास ' करत होता ते क्षेत्र . म्हणजे ' निधिनिवास ' . अर्थात पुढे त्याचा अपभ्रंश निद्धवास , धीवास , निवास , निवासे असा होत होत , सध्याचे ' नेवासा ' हे नाव तयार झाले . देवेंद्राचे ऐश्वर्य याच कालावधीत गुरूच्या शापामुळे क्षीरसागरात गडप झाल्याने समुद्रमंथन केल्याचा उल्लेख येतो . त्यासाठी मेरुपर्वताची रवी व वासुकी सापाची दोरी करून समुद्रमंथन केले गेले . दानवांनी अमृताच्या अभिलाषेने मदत केली . मेरुपर्वत बुडू नये म्हणून साक्षात विष्णूंनी कूर्मरूपाने तो तोलून धरला . मंथनातून निघालेल्या चौदा रत्नांमध्ये इंद्राचा ऐरावत , उच्चैःश्रवा नावाचा घोडा , कामधेनू आदी रत्ने निघाली ... हलाहल नावाचे विष निघाल्यावर संपूर्ण जीवसृष्टी होरपळून निघाली , म्हणून भगवान शंकरांनी ते गिळून टाकले . त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला ( त्यावरूनच त्यांना नीळकंठ हे नामाभिधान प्राप्त झाले . ) शेवटी निघालेल्या अमृताचा कुंभ दानवांनी पळवला . सुंद , उपसुंद , राहू , केतू आदी दैत्यमंडळींनी मग अमृतपान करायचे ठरवले . देवांना ' आता काय करायचे ' असा प्रश्न पडला . त्यांनी संकटमोचन श्रीविष्णूंकडे धाव घेतली . त्यावर श्रीविष्णूंनी मोहिनीचे लावण्यमयी , मनोरम रूप धारण केले . दैत्य त्या अलौकिक त्रिभुवनसुंदरीला पाहून पाघळले . मोहिनीने आपल्या नेत्रविभ्रमांनी सर्वांना घायाळ करत अमृतकुंभ हाती घेतला . त्यावर सर्व दैत्यांनी तिला अमृतवाटप करायचा आग्रह केला , तरीही मोहिनीरूपधारक विष्णूंनी त्यांना सांगितले , " स्त्री हे अनर्थाचे मूळ समजले जाते . माझा भरवसा कसा धरता ? " परंतु तिच्या दिव्य सौंदर्याचे रसपान करताना , दैत्यांना भान राहिले नाही किंवा तिच्या सौंदर्यापुढे अमृताची त्यांना किंमत वाटत नसल्याने त्यांनी तिलाच अमृतवाटप करायला सांगितले . मग मोहिनीने अमृताऐवजी मंथनातून निघालेल्या मंदिरेचे वाटप केले . मदिरा प्राशन करताच दैत्य मोठ्याने बरळू लागले , एकमेकांत भांडणे करू लागले . मोहिनीच्या रूपाने भ्रमिष्ट झालेले दैत्य भान हरवून बसले . मग मोहिनी , शिताफीने अमृतकुंभ हाती घेऊन देवांकडे आली . त्यांनी देवाच्या पंक्तीला अमृताचे तर दानवांच्या पंक्तीत सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले. ही गोष्ट राहूच्या लक्षात आली आणि ते देवांच्या पंक्तीत येवून बसले. मोहिनीरुप घेतलेल्या विष्णूंनी त्यांना अमृत दिले परंतु त्यांनी अमृत प्राशन केल्याक्षणी जेव्हा हा प्रकार विष्णूंच्या लक्षात आला, सुदर्शन चक्राने लगेच त्यांचे शीर छेदले गेले. राहूचे शीर उडून ज्या ठिकाणी जाऊन पडले त्या गावाला राहुरी असे नाव पडले. व काया म्हणजे धड जेथे पडले त्या ठिकाणाला कायगाव असे म्हणतात. तसेच श्री विष्णूंनी मोहिनीरुप घेवून अमृताचे वाटप केले ते ठिकाण म्हणजे नेवासे. ते करत असताना अमृताचे काही थेंब प्रवरा नदीच्या पात्रात पडले . म्हणून प्रवरेला ' अमृतवाहिनी ' हे नाव मिळाले . त्या ठिकाणचे पाणी प्रवरेच्या इतर ठिकाणच्या पाण्यापेक्षा चवदार , मधुर लागत असल्याचे आजही सांगितले जाते म्हणून मोहिनीराज यांचे भव्य मंदिर नेवासे येथे आहे.
नेवाशासंदर्भातील प्राचीन शिलालेख ' नेऊरगाव ' येथील यादव रामचंद्रदेव यांच्या शके १२०० च्या ( इसवी सन १२७८ ) शिलालेखात आढळतो . त्या शिलालेखातील ' निधिवास खंपणक ' म्हणजेच ' नेवासा " होय . लेख भग्नावस्थेत आहे . नेवासे येथे १ ९५४-५६ च्या काळात झालेल्या उत्खननावरून डॉ.हं. र्धी . सांकलिया यांनी नेवाशाचा कालक्रम पुढीलप्रमाणे दिला आहे . ( उत्खननाचे विवरण पुढे येईलच ) १. प्राचीन अश्मयुगीन काळ ( मध्य प्लायस्टोसिन दीड लाख वर्षांपूर्वी ) २. मध्ययुगीन अश्म काळ ( उत्तर पंचवीस हजार वर्षांपूर्वी ) ३. ताम्रपाषाण युग इसवी सन पूर्व १०,५०० ते इसवी सन पूर्व १०००.
ज्ञानेश्वरांच्या आधीपासून , नेवासे सुभ्यावर यादवांचा अंमल होता . त्यांची परगणा कचेरी ( सध्या जिथे कोर्ट आहे त्या ठिकाणी ) नेवासे येथे होती . त्याहीपूर्वी येथे ' लाडमोड ' नावाचा पेठेचा मोठा गाव होता . खरे तर , ' नेवासे ' , ' लाडमोड ' व ' माळ मोहतर्फ ' या तीन गावांना वळसा घालून पूर्वी प्रवरा नदी वाहत असे . त्या ठिकाणी जवाच्या आकाराची खिंड होती . कालौघात नदीच्या प्रवाहाने खिंड असलेला खडक फुटून नदीचा मार्ग बदलला ; तसेच , लाडमोड आणि माळ मोहतर्फ ही गावेही नष्ट झाली . ( सरदार चंद्रचूडांचा ) मूळ वाडा म्हणजे सध्याचा हावसेंचा वाडा ! ) सध्या , प्रवरा नदीमुळे नेवासे खुर्द व नेवासे बुद्रुक असे गावाचे विभाजन झाले आहे . त्यालाच अनुक्रमे अलिकडचे नेवासे व पलीकडचे नेवासे म्हणतात . तेथेच कणेरेश्वर ( वीरेश्वर ) ऊर्फ करवीरेश्वराचे मंदिर होते . दक्षिण काशी शिवस्थानाचा महिमा जाणून त्याच पडक्या शिवालयाच्या एका खांबाला पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली . पैस खांबावर शिलालेख आहे. यादवानंतर नेवासा सुभा बहामनी राज्यात व पुढे नगरच्या निजामशाही अमलात होता. मलिकअंबरने प्रतबंदी प्रथम केली हा सुभा निजामशाहीनंतर मोगलांच्या ताब्यात होता . त्या अवधीत , शाहूराजाच्या लगात औरंगजेबाने तो मराठ्धाना आदण दिला . सुभा १७२४ नंतर हैदराबादच्या निजामाने घेतला . उदगीरच्या लढाईच्या वेळी , १७६० मध्ये या प्रातावर पेशव्यांचा अमल होता . पेशव्यांचा नेवासे येथील सुभेदार नारो .. बाजी नगरकर याने या सुभ्याची पुन्हा प्रतबंदी केली . पेशव्यांचा अंमल १८१८ पर्यंत होता . मग हा सर्व भाग इंग्रजांच्या ताब्यात गेला . छत्रपतींचे जामदार , देशमुख , सेनापती हंबीरराव मोहिते , नाईक , लोखंडे यांचे वंशज आजही नेवाशात आहेत . मोहित्यांची गल्ली प्रसिद्धच आहे . ती सगळी मंडळी आपापसात भावकीत आहेत . छत्रपतींचे मेहुणे अर्थात सोयराबाईचे - बंधू , सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज नेवाशात आहेत . ज्ञानेश्वरांनी या भूमीमध्ये ज्ञानेश्वरी सांगितली . त्याबद्दल स्वतः माऊली म्हणतात शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरे । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाला । -ज्ञानेश्वरी , अध्याय १८ वा ओवी १८११ ज्ञानेश्वराच्या मंदिरामागे लाडमोड टेकडी होती . तिचे उत्खनन केल्यावर तिथे जोर्वे संस्कृतीचे अवशेष सापडले . येथून अर्ध्या फर्लांगावर त्याच टेकडीवर संत चक्रधरांना साक्षात्कार झाल्याचा उल्लेख ' स्थानपोथी'मध्ये आला आहे . नेवाशासंदर्भातील उल्लेख स्कंद पुराणामधील ' महालय माहात्म्य ' यात नेवाशासंदर्भात उल्लेख आहे . नेवाशाचा उल्लेख ' महालय ' व ' निधिनिवास ' असा आहे , तर प्रवरेचा ' निधिनिवास ' . उल्लेख ' वरा ' व ' पापहरा ' असा आहे . मोठमोठ्या देवतांचे वास्तव्य म्हणून रामायणामध्ये ' शिवस्थान ' म्हणून या क्षेत्राचा उल्लेख आहे . पूर्वी हा • प्रदेश शिवलिंगांनी व्याप्त होता , म्हणून भाविक वृत्तीचे लोक तिथे पादत्राणे शिवालयच.
भागवत पुराणामध्ये भागवत ग्रंथातील ओवीमध्ये उल्लेख आहे. महानुभाव
पंथाचे आद्य प्रवर्तक चक्रधरस्वामी यांनी ' लीळाचरित्रा' मध्ये मोहिनीराज
अवतारासंबंधी पुढील उल्लेख केला आहे .
वाय . आर . गुप्ते यांनी
भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्या प्राचीन • अवशेष ' या त्रैमासिकामध्ये (
खंड १ ९ , अंक , पहिला पृष्ठ १०७ ) मोहिनीराज अवताराबद्दल उल्लेख केलेला
आहे . संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी गाधा क्रमाक ९ ०८ मध्ये नेवासा
क्षेत्राची महती पुढीलप्रमाणे वर्णली आहे .
याखेरीज सोनोपंत
दांडेकरांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रदीप प्रस्तावनेत
नेवासेसंदर्भात सविस्तर मंथन केलेले आढळते . ' भारतीय संस्कृतिकोश - खंड
पाचवा ' यातही उल्लेख आहे . ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या ' पसायदान ' या
वार्षिक अंकात अनेकदा नेवाशासंदर्भातील माहिती आलेली आहे . त्याखेरीज
सरकारी कागदपत्रे , गॅझेट डॉ . सांकलियांचे अहवाल , १ ९ १५ मधील न्यायालयीन
कागदपत्रे , दस्तऐवज यांत सविस्तर उल्लेख आहेत . दुर्गा भागवतांनी ' पैस '
या पुस्तकात लिहिले आहे ' गोदावरी सौम्य तर प्रवरा लहान व शांत आहे . या
दोन नद्यांच्या मधल्या साध्या गावात पैसने दंतकथेला सत्यकथेचे परिमाण दिले
आहे . ख्रिस्ताचे प्रतीक क्रूस , तसा ज्ञानेश्वराचा पैस खांब आहे . त्याला
टेकून ज्ञानेश्वरांनी काल , अवकाश यांतील सीमारेषा अनुभवली . खोली , उंची ,
रहस्य खुलेपणा , गूढ प्रांजळ वेदना , सुख , मृत्यू आणि जीवन , भोळेपणा आणि
ज्ञान यांतले ऐक्य टिपले . निद्वंद्वाची खूण ओळखून ज्ञानेश्वरीत भरली .
विठोबाची प्रतिमा जशी पाषाणी , अनलंकृत , भावगम्य झाली आहे तसाच हा खांब
ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे , ओथंबा किंवा ओळंबा आहे . पैस हे
अस्तित्वाचे प्रतीक आहे . म्हणून नेवाशात आपण आपल्या आशा - निराशा विसरतो ,
मनात उभा राहतो ; पैसाला टेकून शांत स्वराने ज्ञानेश्वरी बदणारा तरुण योगी
; त्याची प्रतिमा तोलून धरणे आणि ती कल्पक , भाविक मनात दाखवणे हे खांबाचे
कार्य . इथे कर्मशीलता भासमान होते . काहीतरी प्राणपणाने करावे अशी
प्रेरणा इथे मिळाल्यावाचून राहत नाही .
सांस्कृतिक नेवासे
ज्ञानेश्वरांचा वारकरी संप्रदाय व चक्रधर नागदेवाचार्यांचा महानुभाव पंथ हे
आपापले ग्रंथप्रचाराचे कार्य नेवाशाच्या पंचक्रोशीत एकाच वेळी सहिष्णुतेने
करत होते , धर्मजागृतीचे काम करत होते . तेराव्या शतकामध्ये येथे
साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या क्रांती घडत होती . थोडक्यात , नेवासा हे
ज्ञान , ध्यान , कर्म व भक्ती यांचे विद्यापीठ होते असे म्हटले तर ते उचित
होईल . महानुभाव पंथाचे संस्थापक व ' अवतारी पुरुष ' चक्रधरस्वामींना
चक्रधर टेकडीवर ( लाडमोड टेकडीवर ) दिव्यदृष्टी प्राप्त झाली , ते डोमेगाव (
कमालपूर , ता . श्रीरामपूर ) येथून नेवाशाला आले . ( स्थानपोथी ) .
त्यांनी सहावी दिवाळी नेवासे येथे शके १ ९ १५ मध्ये साजरी केली . :
वारकऱ्यांचे आद्यपीठ नेवासा चक्रधरस्वामींचा लोकांमध्ये प्रवेश झाला तो
पैठणमध्ये . ते त्याआधी जवळजवळ बारा वर्षापर्यंत एकांतवासात होते . त्यांनी
बाईसा हिला प्रेमदान ( अनुग्रह ) दिला , तो पैठणमध्ये . चक्रधरांनी तेथे
पहिली दिवाळी साजरी केली . दुसरी दिवाळी सिन्नर , जिल्हा नाशिक इथे , तिसरी
दिवाळी बीड , चौथी हिवराळी ( जालना ) व पाचवी दिवाळी गणपत मढ , पैठण इथे
साजरी केली . त्यांनी सहावी दिवाळी नेवाशात साजरी केली.
ज्ञानेश्वरांप्रमाणेच मराठी सारस्वतामध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा
लागेल असे कवी व लेखक या भूमीत निर्माण झाले.
मोहिनीराज मंदिर श्री क्षेत्र नेवासा
भगवान विष्णूच्या मोहिनी अवतराला समर्पित एकमेव मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. हे मंदिर मोहिनिराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर म्हणनू ओळखलं जातं. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे. मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैली असून विविध प्रकारच्या मुर्ती नक्षीदार दगडावर आहेत. मंदिराचे बांधकाम उंचावर आहे तसेच प्रवेशद्वार उत्तर बाजूला आहे.
मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात श्री मोहिनीराजाची आर्कषक मूर्ती आहे. मूर्ती उंच सिंहासनावर विराजित असून हातात शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी आहे. नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, पायात तोडे तर डोक्यावर मुकुट घातलेली साडे चार फूट उंचीची मोहिनीराजाची मूर्तीचे दर्शन घडल्यावर मन आनंदाने भरुन येतं. मूर्तीच्या शेजारी श्री लक्ष्मी विराजित आहे. दैत्य व देवांचे समुद्र मंथन येथे झाले होते व त्यावेळी विष्णूने मोहिने रूप घेतले होते असे सांगितले जाते या मोहिनीवर शंकर मोहित झाले होते तेव्हा शंकराचे मार्तंड भैरव अवतारात त्यांची पत्नी होण्याचे वचन विष्णूनी दिले होते तीच ही खंडोबाची म्हाळसा आहे अथवा तिचे रूप घेतलेली पार्वती हीच खंडोबाची म्हाळसा अशी लोकभावना आहे. असे ही म्हणतात की मोहिनीरूप घेतल्यावरही देवांना विष्णू दिसतं होते तर दानवांना त्यांचे स्त्री रूप दिसतं होते म्हणून या मूर्तीचे वैशीष्टय म्हणजे हे अर्धनारी रूप आहे.

याच गावात प्रवरा नदीच्या तीरावर मोहिनीराजाचे जुने पुरातन मंदिर अस्तित्वात होते असे ग्रामस्थ सांगतात. आज त्या जुन्या मोहिनीराज मंदिराचे अवशेष केवळ भग्न अवशेष शिल्लक आहेत. जुन्या मंदिराचा शोध घेत असताना आपण एका अरुंद रस्त्याने प्रवरा नदीच्या घाटावर जाऊन पोहचतो. तिथे आपल्याला भग्नावस्थेत असलेले मंदिराचे प्रवेशद्वार, मंदिराचे काही अवशेष, शिवपिंडी, भग्न नंदी व काही मूर्ती इतरत्र विखुरलेल्या दिसतात. सद्यस्थितीत शिल्लक असलेल्या प्रवेशद्वाराच्या सुंदर द्वारशाखेवरून पुरातन मंदिराच्या सौंदर्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. घाटावर अजून काही मंदिरे असून त्यातील गणपती व मारुती मंदिर चांगल्या स्थितीत आहेत. या सर्व अवशेषांवरून लक्षात येते की प्राचीन असा ऐतिहासिक वारसा नेवासा गावाला लाभला आहे.
करवीरेश्वर मंदीर :-
या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे गावात आहे असे समजले जाते. १५ व्या शतकापर्यंत करवीरेश्वर हे महादेवाचं मंदिर अस्तित्वात होते.पण नंतर उध्वस्त झाले.याचे काहे अजून दोन जुने खांब आवारातल्या दत्त मंदिरात दिसले.यावरून हे मंदिर किती जुने हे समजेत.सध्या तो भाग पुरातत्व विभागाचा आहे.

ज्ञानेश्वर माउलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैस खांब
“जो जे वांछील ,तो ते लाहो||प्राणिजात ||” असे समस्त विश्वासाठी पसायदान जिथे मागून साऱ्या विश्वाची ‘माऊली’ झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पैस या खांबाला भेट दिली.उणापुरा तीन फुट कातळ खांब ,जरासा एकटाच! डाव्या बाजूला सूर्य चंद्र हे पैस म्हणजे अवकाश यांच चिरंतर प्रतिक आहे.प्राकृत मराठी जिथे नवतरुण युवकाच्या असीम विद्येतून जिथे आकार घेत होती,ज्ञानेश्वरीचे अमृत जिथे पाझरले तिचा साक्षीदार हा पैस!पैसाभोवती वारकरी सांप्रदाय आजही परंपरा जपत आहे ,याचे मुल्य कित्येक पिढ्या चुकवू शकत नाही.दोन क्षण पैसवर डोके टेकवले असता,काळ गळून पडावा आणि माउली प्रगटावी.अमृताचे बोल कानी पडत आहे,समस्त जग आजूबाजूला बसून तल्लीन व्हावे असे वाटले.दुर्गाबाईंचे ‘पैस’ हे ललित पुस्तक प्रसिद्ध आहे.त्यात बाई म्हणतात “पैसच्या वरचे जग आजही पैशावरच तोलले आहे.”पण तरीही ज्ञानेश्वरी ज्याने अनुभवली त्याने अनेक कोनापैकी एक जीवन कोन नक्कीच जाणला आहे.
खांबावरील लेखन संस्कृत आहे, तेलवाती सुरु राहीली पाहिजे. आणि शेवटी, शापाशिर्वाद आहेत. देव, तुळपुळे, माटे यांच्या ग्रंथात ह्या लेखाचा उल्लेख नाही मात्र श्री. महेश तेंडुलकरांच्या 'शिलालेखांच्या विश्वात' ह्या ग्रंथात ह्याचे वाचन आढळले ते याप्रमाणे
ओन्नम : [कर] वीरेश्वराय । पिता
महेन यत्पूर्व [दत्तं] षट्कं जगद्गुरोः [जगद्गुरो]
अखंडवर्त्ति तैलार्थ प्र
तिमासं सदा हि तत् । [रूपका]
णां षट्क संख्या देया आचंद्रसू
र्यकं । [ यः स्वी] करोति दुष्टः [सः ] तस्य
पूर्वे व्रजंत्यधः । मंगल महाश्रीः ।।
१. अर्थ : ॐ करवीरेश्वरास नमस्कार असो. पूर्वी माझ्या पितामहाने [ वडिलांनी] जगद्गुरूस दरमहा अखंड तेलवातीसाठी [नंदादीप सतत तेवत ठेवण्यासाठी] जे सहा रुपये दिले तेच सहा रुपये [आकाशात] चंद्रसूर्य असेपर्यंत देण्यात यावेत. जो त्यांचा अपहार करील तो दुष्ट होय, त्याचे पूर्वज नरकात जातील. महाश्री [मोहनीराज ] मंगल करो...
अर्थात हा लेख कालोल्लेखविहिन आहे. श्री गुप्ते यांनी याचे वाचन केले. मात्र त्यांनी रुपका हा तिथे नसलेला शब्द तिथं नष्ट झालेला असल्याने ठशांच्या आधारे अंदाजे दिला आहे मात्र त्याचा अर्थ रुपया लावला आहे तो त्यानुसार हा लेख बहुधा पेशवेकालीन असावा असे दिसते किंवा रुपका म्हणजे रुपये नसून चांदीची नाणी असावीत असेही असू शकते.
संदर्भ :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) https://www.facebook.com/Mohinirajmandir/posts/4122361424530460/?locale=hi_IN
३) https://www.santsahitya.in/tirthkshetra/newasa/
४) https://shrivridheshwar.in/nevasa-sant-dnyaneshwar-templemaharaj/
५) Ghosh, A. Ed., An Encyclopedia of Indian Archaeology, Vol. 2, New Delhi, 1989.
६) Sankalia, H. D. & Deo, S. B. From History to prehistory at Nevasa (1954-56), Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 1960.
७) Sankalia, H. D. & Mate, M. S. Antiquities of Nevasa, Mumbai, 1960.
८) देव, शांताराम भालचंद्र, महाराष्ट्रातील उत्खनने, माहिती आणि प्रक्षेपण मंत्रालय, प्रकाशन विभाग, भारत सरकार, मुंबई, १९६१.
https://marathivishwakosh.org/44179/
रत्न धारण केलेल्या रतन गडावर अमृतवाहिनी प्रवरा नदीचा उगम होतो..
#राहू
नामक राक्षसाचे शिर*, श्री विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने, (स्री रूप)
मोहिनी रुपात, नेवासे याठिकाणी , समुद्रमंथनातून चौदा रत्नांसोबत बाहेर
आलेल्या, देवांना अमृत आणि असुरांना मदिरा वाटप चालू असताना, राहू ने वेश
बदलून - देव रूप धारण करून - छळाने, अमृत प्राशन केले म्हणून *धडापासून
वेगळे केले आणि ते या गडावर पडले तर धड राहुरी याठिकाणी.. तेव्हा राहुने
प्राशन केलेले अमृत कंठातून अमृतवाहिनी नदी रूपाने रतन गडावरून वाहू लागले
.
रतनगड
तर सर केला पण कथा.. आणि त्याचे या गावांशी असलेले संबंध याचे कुतूहल सोबत
राहिले.. नेवासे आणि राहुरी, अमृत वाहिनी प्रवरा ही तर ओळखीची नावे होती..
या कुतुहलाचा एक भाग म्हणून नेवासे आणि प्रवरा संगम या ठिकाणाला दिलेली
भेट
.
सोबत
श्री रामचंद्रांनी प्रवरा संगम येथे रावणाचा मामा मारिज या हरीण रुपात
आलेल्या सोन्याच्या हरणाचा वध केला... प्रवरा संगमावरील कायगाव-टोका या
गावाची नावे या घटनांना अनुसरून पडली... अशा अनेको घटना देखील पौराणिक
कथेवर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात
https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/mohiniraj-temple-and-laxmi-temple-in-newasa-122101200020_1.html
भगवान विष्णूच्या मोहिनी अवतराला समर्पित एकमेव मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. हे मंदिर मोहिनिराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर म्हणनू ओळखलं जातं. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे. मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैली असून विविध प्रकारच्या
मुरत्या या नक्षीदार दगडावर आहेत. मंदिराचे बांधकाम उंचावर आहे तसेच
प्रवेशद्वार उत्तर बाजूला आहे. मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात श्री
मोहिनीराजाची आर्कषक मूर्ती आहे. मूर्ती उंच सिंहासनावर विराजित असून हातात
शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी आहे. नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, पायात
तोडे तर डोक्यावर मुकुट घातलेली साडे चार फूट उंचीची मोहिनीराजाची मूर्तीचे
दर्शन घडल्यावर मन आनंदाने भरुन येतं. मूर्तीच्या शेजारी श्री लक्ष्मी
विराजित आहे.
मंदिराचा इतिहास
समुद्रमंथन झाले तेव्हा 14 रत्ने बाहेर आली. त्यापैकी एक अमृत होते. अमृत
कलश घेऊन धन्वतरी देवता प्रकट झाले. तेव्हा अमृत कलश बघून देवांना आणि
राक्षसांना आनंद झाला. पण राक्षसांना अमृत मिळाल्यास त्यांना अमरत्व
प्राप्त होईल म्हणून देवांना चिंता पडली. त्यावेळी दानव कलश हिसकावून पळू
लागले तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. त्यांनी सर्वांना
मोहित करुन अमृत वाटपाचे काम हाती घेतले. त्यांनी देवाच्या पंक्तीला
अमृताचे तर दानवांच्या पंक्तीत सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले. ही गोष्ट
राहूच्या लक्षात आली आणि ते देवांच्या पंक्तीत येवून बसले. मोहिनीरुप
घेतलेल्या विष्णूंनी त्यांना अमृत दिले परंतु त्यांनी अमृत प्राशन
केल्याक्षणी जेव्हा हा प्रकार विष्णूंच्या लक्षात आला, सुदर्शन चक्राने
लगेच त्यांचे शीर छेदले गेले. राहूचे शीर उडून ज्या ठिकाणी जाऊन पडले त्या
गावाला राहुरी असे नाव पडले. व काया म्हणजे धड जेथे पडले त्या ठिकाणाला
कायगाव असे म्हणतात. तसेच श्री विष्णूंनी मोहिनीरुप घेवून अमृताचे वाटप
केले ते ठिकाण म्हणजे नेवासे. म्हणून मोहिनीराज यांचे भव्य मंदिर नेवासे
येथे आहे.
असे ही म्हणतात की मोहिनीरूप घेतल्यावरही देवांना विष्णू दिसतं होते तर
दानवांना त्यांचे स्त्री रूप दिसतं होते म्हणून या मूर्तीचे वैशीष्टय
म्हणजे हे अर्धनारी रूप आहे.
संत
ज्ञानेश्वर मंदिर ते श्री वृद्धेश्वर मंदिर जाण्यासाठी १ तास ४५ मिनिटे
लागतात. संत ज्ञानेश्वर मंदिर आणि श्री वृद्धेश्वर मंदिर दरम्यान अंदाजे
अंतर ७० किमी आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा येथे एका खांबाजवळ ज्ञानेश्वरी लिहिली ते ठिकाण म्हणजे नेवासा – ज्ञानेश्वर मंदिर.
संत ज्ञानेश्वर मंदिर हे भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील अहमदनगर
जिल्ह्यातीलनेवासा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या
काठावर वसलेले आहे.
या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी
सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा
ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या
मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा
वाचली तो खांब अजूनही नेवासे या गावात आहे.
या मंदिराच्या मागे ज्ञानेश्वर उद्यान आहे.
नेवासा – ज्ञानेश्वरीचे निर्मितीस्थान
या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या
तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध
ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका
खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब
अजूनही नेवासे या गावात आहे. त्याला पैस असे म्हणले जाते. काळाच्या ओघात
करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले.पैस खांबाच्या भोवती बांधण्यात आलेल्या
नव्या मंदिराचे उद्घाटन १९६३ साली झाले. या मंदिराच्या मागे ‘ज्ञानेश्वर
उद्यान’साकारण्याचे काम सुरू आहे.
मोहिनीराज मंदिर
याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत
लिहिल्याप्रमाणे राहूचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले
आणि राहू या असुराचा वध केला. जिथे हा राहूचा वध झाला ते ठिकाण म्हणजे
नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर कलात्मकतेचा
सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे
आहे.
पुरातत्वीय महत्त्व
या ठिकाणी पुरातत्व खात्याने उत्खनन केले असून येथे दगडी हत्यारे सापडली आहेत. त्यात हातकुर्हाडी सापडल्या आहेत.
https://www.santsahitya.in/tirthkshetra/newasa/
https://shrivridheshwar.in/nevasa-sant-dnyaneshwar-templemaharaj/
*नेवासाः प्राचीन आणि अर्वाचीन काळातील*
(Forwarded)
नेवाशाची भरभराट इसवी सनपूर्व तिसरं शतक ते पहिलं शतक या काळात झाली ; नेवाशाचा बाह्य जगताशी , अगदी रोमन साम्राज्यांतर्गत प्रदेशापर्यंत संबंध आला . वारकरी संप्रदाय व महानुभाव पंथ नेवाशाच्या पंचक्रोशीत इतिहासकाळात एकाच वेळी नांदले . तेव्हा तेथे साहित्यिक व सांस्कृतिक क्रांतीच घडून आली ! नेवासा हे ज्ञान , ध्यान , कर्म व भक्ती यांचे विद्यापीठ बनले . नेवाशाची तेव्हापासून आजपर्यंतची कहाणी दख्खनच्या पठारावरील , महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे असणाऱ्या अहमदनगर या ऐतिहासिक जिल्ह्यातील नेवासा हे एक तालुक्याचे गाव आहे . अहमदनगरपासून इशान्येला साधारण ५५ किलोमीटर अंतरावर नेवासा आहे . तालुक्याचा विस्तार १ ९ : १ ९ ते १ ९ ४० उत्तर अक्षांश व ७४ ° ४८ ते ७५ ११ पूर्व रेखांशावर असून पूर्वेला शेवगाव , पश्चिमेकडे राहुरी , श्रीरामपूर , दक्षिणेकडे नगर , पाथर्डी हे तालुके ; आणि उत्तरेकडे औरंगाबाद जिल्ह्याची हद्द , म्हणजेच गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे . तालुक्याच्या चतुःसीमा अशा आहेत . रचना : नेवासा तालुका हा साधारणतः मैदानी भाग असून त्याचा उतार गोदावरी नदीकडे आहे . समुद्रसपाटीपासूनची उंची ४५० ते ५७० मीटरपर्यंत आहे . तालुक्याच्या नैऋत्येकडील भाग जास्त उंचीचा असून तो ‘ अहमदनगर ’ डोंगररांगेचा आहे . दक्षिणेकडील भाग विखंडित टेकड्यांचा आहे . त्याच भागातून अनेक लहान ओढे , नाले , ओहोळ उगम पावतात आणि उत्तरेकडे वाहत जाऊन गोदावरीच्या अनेक उपप्रवाहांत मिळतात . जलप्रणाली : नेवासे तालुक्यामध्ये जलप्रणाली उत्तर दिशेने म्हणजे गोदावरी नदीच्या दिशेने आढळते . गोदावरी नदी ही अहमदनगर जिल्ह्याचीदेखील उत्तर व ईशान्य बाजूने सीमा आहे . गोदावरी नदीच्या पलीकडच्या तीरापासून औरंगाबाद जिल्ह्याची हद्द सुरू होते . गोदावरी नदीचे पात्र सभोवतालच्या प्रदेशापेक्षा सुमारे सहा ते बारा मीटरपर्यंत खोल आहे . ह्या भागातील गोदावरी पश्चिमेच्या बाजूने ती तालुक्यात उपनदी प्रवरा असून , नदीची मुख्य नेवाशापासून सात किलोमीटर अंतरावर प्रवेश करते . गोदावरी नदीशी प्रवरेचा ज्या ठिकाणी संगम होतो ते गाव म्हणजे कायगाव टोका होय . मात्र पैठणजवळ जायकवाडी येथे ' नाथसागर जलाशयाचे सुमारे वीस लक्ष घनमीटर क्षमता असलेले धरण झाल्याने नेवासे व गंगापूर तालुक्यांतील अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागले . धरणाचा बॅक वॉटर फ्लो थेट नगर - औरंगाबाद राजमार्गाप येतो . त्यामुळे त्या गावाला प्रवरासंगम असे नाव आहे . लेडगा व पानस दुय्यम स्वरूपाच्या नद्या होते . त्याच्यामुळे पश्चिम व दक्षिण भागातील जलप्रणाली तयार झाली आहे . त्या दुय्यम नयाचा उगम दक्षिणेकडील अहमदनगर डोंगररांगांमध्ये झाला आहे.
ऐतिहासिक वारसा अगस्त्य ऊर्फ अगस्ती ऋषी हे महाराष्ट्रीयांचे मूळ ज्ञात पूर्वज मानले . जातात . महाराष्ट्र हा दगडधोंड्यांचा देश असून ' महाराष्ट्र ' या देशनामाचा अतिप्राचीन , स्पष्ट उल्लेख ' महावंश ' या बौद्ध ग्रंथात सापडतो , हे नाव इसवी सन ५०० च्या आसपास प्रचलित झाले असावे . आर्य आणि द्रविड यांचा संयोग हे महाराष्ट्रातील पहिले मोठे स्थित्यंतर आहे . त्यामुळे महाराष्ट्राची निर्मिती व संस्कृती उदयास आली . मराठी भाषेतील जुन्यातला जुना असा शिलालेख म्हैसूरजवळील श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली १११६ नंतर कोरला गेलेला आढळतो .
त्रिभुवनैक पवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र || जेथ जगाचे जीवनसूत्र । श्री महालया असे ॥ तेथ यदुवंश विलासु । जो सकळकळानिवासु ॥ न्यायाते पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥ ज्ञानेश्वरी , अध्याय १८ , ओवी १८०३-०४ प्राचीन काळी देवदैत्यांनी समुद्रमंधन केले असे आपण ऐकतो आणि वाचतो ... तारकासुराने वर मिळवला आणि तो एवढा उन्मत्त झाला , की त्याने स्वर्गावर हल्ला केला . अप्सरांच्या नर्तनात रममाण झालेल्या इंद्राकडून देवगुरूंची अवहेलना , हेळसांड झाली होती . त्यामुळे त्यांनी दिलेल्या शापामुळे इंद्र दुबळा बनला होता . अशातच तारकासुराने स्वर्ग जिंकून सर्व देवतांना हाकलून लावले . तेव्हा श्री विष्णूंनी पृथ्वीवर स्वर्ग वसवण्यासाठी योग्य स्थळाचा शोध घेतला . त्याच ठिकाणी काही काळ स्वर्गातील सर्व देवदेवता वास्तव्य करून होते . कुबेरही आपला ' नवनिधी ' नवा खजिना घेऊन पृथ्वीवर आला . अशा देवदेवतांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले , ते ठिकाण म्हणजेच ' महालय ' किंवा कुबेराचा ' निधी ' ज्या ठिकाणी ' निवास ' करत होता ते क्षेत्र . म्हणजे ' निधिनिवास ' . अर्थात पुढे त्याचा अपभ्रंश निद्धवास , धीवास , निवास , निवासे असा होत होत , सध्याचे ' नेवासा ' हे नाव तयार झाले . देवेंद्राचे ऐश्वर्य याच कालावधीत गुरूच्या शापामुळे क्षीरसागरात गडप झाल्याने समुद्रमंथन केल्याचा उल्लेख येतो . त्यासाठी मेरुपर्वताची रवी व वासुकी सापाची दोरी करून समुद्रमंथन केले गेले . दानवांनी अमृताच्या अभिलाषेने मदत केली . मेरुपर्वत बुडू नये म्हणून साक्षात विष्णूंनी कूर्मरूपाने तो तोलून धरला . मंथनातून निघालेल्या चौदा रत्नांमध्ये इंद्राचा ऐरावत , उच्चैःश्रवा नावाचा घोडा , कामधेनू आदी रत्ने निघाली ... हलाहल नावाचे विष निघाल्यावर संपूर्ण जीवसृष्टी होरपळून निघाली , म्हणून भगवान शंकरांनी ते गिळून टाकले . त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला ( त्यावरूनच त्यांना नीळकंठ हे नामाभिधान प्राप्त झाले . ) शेवटी निघालेल्या अमृताचा कुंभ दानवांनी पळवला . सुंद , उपसुंद , राहू , केतू आदी दैत्यमंडळींनी मग अमृतपान करायचे ठरवले . देवांना ' आता काय करायचे ' असा प्रश्न पडला . त्यांनी संकटमोचन श्रीविष्णूंकडे धाव घेतली . त्यावर श्रीविष्णूंनी मोहिनीचे लावण्यमयी , मनोरम रूप धारण केले . दैत्य त्या अलौकिक त्रिभुवनसुंदरीला पाहून पाघळले . मोहिनीने आपल्या नेत्रविभ्रमांनी सर्वांना घायाळ करत अमृतकुंभ हाती घेतला . त्यावर सर्व दैत्यांनी तिला अमृतवाटप करायचा आग्रह केला , तरीही मोहिनीरूपधारक विष्णूंनी त्यांना सांगितले , " स्त्री हे अनर्थाचे मूळ समजले जाते . माझा भरवसा कसा धरता ? " परंतु तिच्या दिव्य सौंदर्याचे रसपान करताना , दैत्यांना भान राहिले नाही किंवा तिच्या सौंदर्यापुढे अमृताची त्यांना किंमत वाटत नसल्याने त्यांनी तिलाच अमृतवाटप करायला सांगितले . मग मोहिनीने अमृताऐवजी मंथनातून निघालेल्या मंदिरेचे वाटप केले . मदिरा प्राशन करताच दैत्य मोठ्याने बरळू लागले , एकमेकांत भांडणे करू लागले . मोहिनीच्या रूपाने भ्रमिष्ट झालेले दैत्य भान हरवून बसले . मग मोहिनी , शिताफीने अमृतकुंभ हाती घेऊन देवांकडे आली . आणि तिने देवांना अमृत दिले . तरीही राहू नावाचा दैत्य , नजर चुकवून देवरूपात देवांच्या रांगेत येऊन बसल्याचे विष्णूंनी ओळखले . त्याचे खरे स्वरूप सर्व देवांना सांगून त्यांनी त्याचा शिरच्छेद घडवून आणला . अमृतवाटप नेवाशातील प्रवरा नदीच्या तीरावर झाले . ते करत असताना अमृताचे काही थेंब प्रवरा नदीच्या पात्रात पडले . म्हणून प्रवरेला ' अमृतवाहिनी ' हे नाव मिळाले . त्या ठिकाणचे पाणी प्रवरेच्या इतर ठिकाणच्या पाण्यापेक्षा चवदार , मधुर लागत असल्याचे आजही सांगितले जाते . नेवाशासंदर्भातील प्राचीन शिलालेख ' नेऊरगाव ' येथील यादव रामचंद्रदेव यांच्या शके १२०० च्या ( इसवी सन १२७८ ) शिलालेखात आढळतो . त्या शिलालेखातील ' निधिवास खंपणक ' म्हणजेच ' नेवासा " होय . लेख भग्नावस्थेत आहे . नेवासे येथे १ ९५४-५६ च्या काळात झालेल्या उत्खननावरून डॉ.हं. र्धी . सांकलिया यांनी नेवाशाचा कालक्रम पुढीलप्रमाणे दिला आहे . ( उत्खननाचे विवरण पुढे येईलच ) १. प्राचीन अश्मयुगीन काळ ( मध्य प्लायस्टोसिन दीड लाख वर्षांपूर्वी ) २. मध्ययुगीन अश्म काळ ( उत्तर पंचवीस हजार वर्षांपूर्वी ) ३. ताम्रपाषाण युग इसवी सन पूर्व १०,५०० ते इसवी सन पूर्व १०००.
ज्ञानेश्वरांच्या आधीपासून , नेवासे सुभ्यावर यादवांचा अंमल होता . त्यांची परगणा कचेरी ( सध्या जिथे कोर्ट आहे त्या ठिकाणी ) नेवासे येथे होती . त्याहीपूर्वी येथे ' लाडमोड ' नावाचा पेठेचा मोठा गाव होता . खरे तर , ' नेवासे ' , ' लाडमोड ' व ' माळ मोहतर्फ ' या तीन गावांना वळसा घालून पूर्वी प्रवरा नदी वाहत असे . त्या ठिकाणी जवाच्या आकाराची खिंड होती . कालौघात नदीच्या प्रवाहाने खिंड असलेला खडक फुटून नदीचा मार्ग बदलला ; तसेच , लाडमोड आणि माळ मोहतर्फ ही गावेही नष्ट झाली . ( सरदार चंद्रचूडांचा ) मूळ वाडा म्हणजे सध्याचा हावसेंचा वाडा ! ) सध्या , प्रवरा नदीमुळे नेवासे खुर्द व नेवासे बुद्रुक असे गावाचे विभाजन झाले आहे . त्यालाच अनुक्रमे अलिकडचे नेवासे व पलीकडचे नेवासे म्हणतात . तेथेच कणेरेश्वर ( वीरेश्वर ) ऊर्फ करवीरेश्वराचे मंदिर होते . दक्षिण काशी शिवस्थानाचा महिमा जाणून त्याच पडक्या शिवालयाच्या एका खांबाला पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली . पैस खांबावर शिलालेख आहे. यादवानंतर नेवासा सुभा बहामनी राज्यात व पुढे नगरच्या निजामशाही अमलात होता. मलिकअंबरने प्रतबंदी प्रथम केली हा सुभा निजामशाहीनंतर मोगलांच्या ताब्यात होता . त्या अवधीत , शाहूराजाच्या लगात औरंगजेबाने तो मराठ्धाना आदण दिला . सुभा १७२४ नंतर हैदराबादच्या निजामाने घेतला . उदगीरच्या लढाईच्या वेळी , १७६० मध्ये या प्रातावर पेशव्यांचा अमल होता . पेशव्यांचा नेवासे येथील सुभेदार नारो .. बाजी नगरकर याने या सुभ्याची पुन्हा प्रतबंदी केली . पेशव्यांचा अंमल १८१८ पर्यंत होता . मग हा सर्व भाग इंग्रजांच्या ताब्यात गेला . छत्रपतींचे जामदार , देशमुख , सेनापती हंबीरराव मोहिते , नाईक , लोखंडे यांचे वंशज आजही नेवाशात आहेत . मोहित्यांची गल्ली प्रसिद्धच आहे . ती सगळी मंडळी आपापसात भावकीत आहेत . छत्रपतींचे मेहुणे अर्थात सोयराबाईचे - बंधू , सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज नेवाशात आहेत . ज्ञानेश्वरांनी या भूमीमध्ये ज्ञानेश्वरी सांगितली . त्याबद्दल स्वतः माऊली म्हणतात शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरे । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाला । -ज्ञानेश्वरी , अध्याय १८ वा ओवी १८११ ज्ञानेश्वराच्या मंदिरामागे लाडमोड टेकडी होती . तिचे उत्खनन केल्यावर तिथे जोर्वे संस्कृतीचे अवशेष सापडले . येथून अर्ध्या फर्लांगावर त्याच टेकडीवर संत चक्रधरांना साक्षात्कार झाल्याचा उल्लेख ' स्थानपोथी'मध्ये आला आहे . नेवाशासंदर्भातील उल्लेख स्कंद पुराणामधील ' महालय माहात्म्य ' यात नेवाशासंदर्भात उल्लेख आहे . नेवाशाचा उल्लेख ' महालय ' व ' निधिनिवास ' असा आहे , तर प्रवरेचा ' निधिनिवास ' . उल्लेख ' वरा ' व ' पापहरा ' असा आहे . मोठमोठ्या देवतांचे वास्तव्य म्हणून रामायणामध्ये ' शिवस्थान ' म्हणून या क्षेत्राचा उल्लेख आहे . पूर्वी हा • प्रदेश शिवलिंगांनी व्याप्त होता , म्हणून भाविक वृत्तीचे लोक तिथे पादत्राणे शिवालयच.
भागवत पुराणामध्ये भागवत ग्रंथातील ओवीमध्ये उल्लेख आहे. महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक चक्रधरस्वामी यांनी ' लीळाचरित्रा' मध्ये मोहिनीराज अवतारासंबंधी पुढील उल्लेख केला आहे .
वाय . आर . गुप्ते यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ यांच्या प्राचीन • अवशेष ' या त्रैमासिकामध्ये ( खंड १ ९ , अंक , पहिला पृष्ठ १०७ ) मोहिनीराज अवताराबद्दल उल्लेख केलेला आहे . संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी गाधा क्रमाक ९ ०८ मध्ये नेवासा क्षेत्राची महती पुढीलप्रमाणे वर्णली आहे .
याखेरीज सोनोपंत दांडेकरांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रदीप प्रस्तावनेत नेवासेसंदर्भात सविस्तर मंथन केलेले आढळते . ' भारतीय संस्कृतिकोश - खंड पाचवा ' यातही उल्लेख आहे . ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या ' पसायदान ' या वार्षिक अंकात अनेकदा नेवाशासंदर्भातील माहिती आलेली आहे . त्याखेरीज सरकारी कागदपत्रे , गॅझेट डॉ . सांकलियांचे अहवाल , १ ९ १५ मधील न्यायालयीन कागदपत्रे , दस्तऐवज यांत सविस्तर उल्लेख आहेत . दुर्गा भागवतांनी ' पैस ' या पुस्तकात लिहिले आहे ' गोदावरी सौम्य तर प्रवरा लहान व शांत आहे . या दोन नद्यांच्या मधल्या साध्या गावात पैसने दंतकथेला सत्यकथेचे परिमाण दिले आहे . ख्रिस्ताचे प्रतीक क्रूस , तसा ज्ञानेश्वराचा पैस खांब आहे . त्याला टेकून ज्ञानेश्वरांनी काल , अवकाश यांतील सीमारेषा अनुभवली . खोली , उंची , रहस्य खुलेपणा , गूढ प्रांजळ वेदना , सुख , मृत्यू आणि जीवन , भोळेपणा आणि ज्ञान यांतले ऐक्य टिपले . निद्वंद्वाची खूण ओळखून ज्ञानेश्वरीत भरली . विठोबाची प्रतिमा जशी पाषाणी , अनलंकृत , भावगम्य झाली आहे तसाच हा खांब ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे , ओथंबा किंवा ओळंबा आहे . पैस हे अस्तित्वाचे प्रतीक आहे . म्हणून नेवाशात आपण आपल्या आशा - निराशा विसरतो , मनात उभा राहतो ; पैसाला टेकून शांत स्वराने ज्ञानेश्वरी बदणारा तरुण योगी ; त्याची प्रतिमा तोलून धरणे आणि ती कल्पक , भाविक मनात दाखवणे हे खांबाचे कार्य . इथे कर्मशीलता भासमान होते . काहीतरी प्राणपणाने करावे अशी प्रेरणा इथे मिळाल्यावाचून राहत नाही .
सांस्कृतिक नेवासे ज्ञानेश्वरांचा वारकरी संप्रदाय व चक्रधर नागदेवाचार्यांचा महानुभाव पंथ हे आपापले ग्रंथप्रचाराचे कार्य नेवाशाच्या पंचक्रोशीत एकाच वेळी सहिष्णुतेने करत होते , धर्मजागृतीचे काम करत होते . तेराव्या शतकामध्ये येथे साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या क्रांती घडत होती . थोडक्यात , नेवासा हे ज्ञान , ध्यान , कर्म व भक्ती यांचे विद्यापीठ होते असे म्हटले तर ते उचित होईल . महानुभाव पंथाचे संस्थापक व ' अवतारी पुरुष ' चक्रधरस्वामींना चक्रधर टेकडीवर ( लाडमोड टेकडीवर ) दिव्यदृष्टी प्राप्त झाली , ते डोमेगाव ( कमालपूर , ता . श्रीरामपूर ) येथून नेवाशाला आले . ( स्थानपोथी ) . त्यांनी सहावी दिवाळी नेवासे येथे शके १ ९ १५ मध्ये साजरी केली . : वारकऱ्यांचे आद्यपीठ नेवासा चक्रधरस्वामींचा लोकांमध्ये प्रवेश झाला तो पैठणमध्ये . ते त्याआधी जवळजवळ बारा वर्षापर्यंत एकांतवासात होते . त्यांनी बाईसा हिला प्रेमदान ( अनुग्रह ) दिला , तो पैठणमध्ये . चक्रधरांनी तेथे पहिली दिवाळी साजरी केली . दुसरी दिवाळी सिन्नर , जिल्हा नाशिक इथे , तिसरी दिवाळी बीड , चौथी हिवराळी ( जालना ) व पाचवी दिवाळी गणपत मढ , पैठण इथे साजरी केली . त्यांनी सहावी दिवाळी नेवाशात साजरी केली. ज्ञानेश्वरांप्रमाणेच मराठी सारस्वतामध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल असे कवी व लेखक या भूमीत निर्माण झाले.
https://www.facebook.com/Mohinirajmandir/posts/4122361424530460/?locale=hi_IN
जुन्या मोहिनीराज मंदिराचे अवशेष, नेवासा –
भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित असे महाराष्ट्रातील एकमेव मंदीर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा
गावात असून सध्याचे हे मंदीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे सरदार
चंद्रचूड यांनी अठराव्या शतकात बांधले आहे. मंदिरातील गर्भगृहात भगवान
विष्णूची मोहिनी अवताराची मूर्ती जिला भक्त “मोहिनीराज” म्हणतात ती
अर्धनारी नटेश्वर रूपातील आहे. याच गावात प्रवरा नदीच्या तीरावर
मोहिनीराजाचे जुने पुरातन मंदिर अस्तित्वात होते असे ग्रामस्थ सांगतात. आज
त्या जुन्या मोहिनीराज मंदिराचे अवशेष केवळ भग्न अवशेष शिल्लक आहेत.
जुन्या
मंदिराचा शोध घेत असताना आपण एका अरुंद रस्त्याने प्रवरा नदीच्या घाटावर
जाऊन पोहचतो. तिथे आपल्याला भग्नावस्थेत असलेले मंदिराचे प्रवेशद्वार,
मंदिराचे काही अवशेष, शिवपिंडी, भग्न नंदी व काही मूर्ती इतरत्र
विखुरलेल्या दिसतात.
सद्यस्थितीत शिल्लक असलेल्या प्रवेशद्वाराच्या
सुंदर द्वारशाखेवरून पुरातन मंदिराच्या सौंदर्याचा अंदाज आपल्याला बांधता
येतो. घाटावर अजून काही मंदिरे असून त्यातील गणपती व मारुती मंदिर चांगल्या
स्थितीत आहेत. या सर्व अवशेषांवरून लक्षात येते की प्राचीन असा ऐतिहासिक
वारसा नेवासा गावाला लाभला आहे.
Rohan Gadekar
नेवासा
नेवासा हे जनश्रुती नुसार म्हाळसा चे जन्म स्थान मानले जाते. नेवासा
शहराला प्राचीन परंपरा आहे येथील कापर्दीकेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरानी
ज्ञानेश्वरी लिहिली. ज्या खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरीची रचना केली
त्या खांबाचे ज्ञानेश्वरी मंदिर बांधण्यात आले आहे. नेवासा गावाचे खुर्द व
बुद्रुक असे प्रवरा नदीने दोन भाग पडतात येथील खुर्द मध्ये म्हाळसा
मोहिनीचे व बुद्रुक मध्ये खंडोबाचे मंदिर आहे.
नेवासा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील तालुक्याचे ठिकाण असुन
अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाट्या पासुन ५ किमी अंतरावर आहे.

नेवासे खुर्द मध्ये म्हाळसा मोहिनीचे दगडी सुंदर मंदिर असुन हे मंदिर
होळकरांचे दिवान चंद्रचूड यांनी बांधलेले आहे. या आधीचे प्राचीन मंदिराचे
मस्जिद मध्ये रुपांतर केले गेल्याने हे नवीन मंदिर बांधल्याचे लोक सांगतात.
या मंदिरात विष्णूची अर्धनारी मुर्ती असुन शेजारी लक्ष्मी ची मुर्ती आहे
दैत्य व देवांचे समुद्र मंथन येथे झाले होते व त्यावेळी विष्णूने मोहिने
रूप घेतले होते असे सांगितले जाते या मोहिनीवर शंकर मोहित झाले होते तेव्हा
शंकराचे मार्तंड भैरव अवतारात त्यांची पत्नी होण्याचे वचन विष्णूनी दिले
होते तीच ही खंडोबाची म्हाळसा आहे अथवा तिचे रूप घेतलेली पार्वती हीच
खंडोबाची म्हाळसा अशी लोकभावना आहे.

नेवासे बुद्रुक मधील प्रवरे काठचे खंडोबा मंदिर सध्या बांधणीचे आहे
माळवदी मंदिराची रचना सोपा व गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात खंडोबा, म्हाळसा,
बाणाई यांच्या बैठ्या दगडी मुर्ती आहेत. हे म्हाळसाचे माहेर असल्याचे
सांगतात चंपाषष्टीस येथे यात्रा भरते .
नेवासे खुर्द मधेही खंडोबाची काही लहान मंदिरे आहेत.
https://jejuri.net/khandoba/
“जो जे वांछील ,तो ते लाहो||प्राणिजात ||” असे समस्त विश्वासाठी पसायदान जिथे मागून साऱ्या विश्वाची ‘माऊली’ झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पैस या खांबाला भेट दिली.उणापुरा तीन फुट कातळ खांब ,जरासा एकटाच! डाव्या बाजूला सूर्य चंद्र हे पैस म्हणजे अवकाश यांच चिरंतर प्रतिक आहे.प्राकृत मराठी जिथे नवतरुण युवकाच्या असीम विद्येतून जिथे आकार घेत होती,ज्ञानेश्वरीचे अमृत जिथे पाझरले तिचा साक्षीदार हा पैस!पैसाभोवती वारकरी सांप्रदाय आजही परंपरा जपत आहे ,याचे मुल्य कित्येक पिढ्या चुकवू शकत नाही.दोन क्षण पैसवर डोके टेकवले असता,काळ गळून पडावा आणि माउली प्रगटावी.अमृताचे बोल कानी पडत आहे,समस्त जग आजूबाजूला बसून तल्लीन व्हावे असे वाटले.दुर्गाबाईंचे ‘पैस’ हे ललित पुस्तक प्रसिद्ध आहे.त्यात बाई म्हणतात “पैसच्या वरचे जग आजही पैशावरच तोलले आहे.”पण तरीही ज्ञानेश्वरी ज्याने अनुभवली त्याने अनेक कोनापैकी एक जीवन कोन नक्कीच जाणला आहे.
१५ व्या शतकापर्यंत करवीरेश्वर हे महादेवाचं मंदिर अस्तित्वात होते.पण नंतर क्षतीग्रस्त झाले.याचे काहे अजून दोन जुने खांब आवारातल्या दत्त मंदिरात दिसले.यावरून हे मंदिर किती जुने हे मला नाही समजले पण तो भाग पुरातत्व विभागाचा आहे.मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यानी मला जेव्हा दहा वर्षापूर्वी आले होते तेव्हाही भुरळ घातली होती आणि आजही!पण इतक्या वर्षात मनाच्या प्रदेशातील उलथापालथ जाणवली. पण मराठीशी नाळ जोडलेली कायमचीच आहे. तेव्हा कवितेच्या आधाराने पैसची नजरेला ओढ आणि आज जरा अवकाश विस्तारलेली आत्मिक नजरेची ओढ जाणवली.पसायदान गाऊन पुढे निघाले,आणखीन एक ‘अमृतानुभव’ पाहायला.
नेवासमध्ये विष्णू अवतारांपैकी एक अर्धनारीनटेश्वर ‘मोहिनिराज’ अवताराचे मंदिर आहे.ह्या मंदिराचे सुव्यवस्थित बांधकाम पाहून मी थक्कच झाले.साधारणत: सतराव्या शतकात यांचे पुर्नबांधणी अहिल्यबाई होळकर यांच्या काळात झाली. प्रवेशद्वाराशीच आकर्षक द्वारपाल-भालदार ,चोपदार मूर्ती आहेत.मंदिराच्या छतावरील विविध वाद्ये धारण केलेली शिल्पे मोहक आहेत. भारवाहक यक्ष अगदी मोजावेत इतकी भरपूर होते.मंदिराच्या चौकटीवर विष्णू अवतार कोरलेले आहेत. मोहिनीराजाच्या मूर्ती शेजारी लक्ष्मीदेवीची मुर्ती आहे. पण मंदिर भर वस्तीत आहे,गाभाराही अनेक माणसांना ,कार्यक्रमांना सामावून घेण्याइतपत मोठा नाही त्यामुळे जास्त काळ थांबू शकले नाही.मंदिराचे बाह्यरूप केवळ अप्रतिम आहे. हेमाडपंथी बांधकाम,होळकर काळातील मंदिरांप्रमाणे आकर्षक कळस.काही शिल्पे या कोरलेली पाहायची राहिली बहुतेक.
मनात विचार आला एक ऐहिक अमृतपान आणि एक आत्मिक अमृतपान अनुभवलेले हे नशीबवान ठिकाणच आहे.
आणि हो नेवासातील शनी शिंगणापूर ही पाहिले.येताना जातांना गुलमोहराचे लाल झुंबर आणि बहावाची सोनेरी झुंबर निसर्गाची ग्वाही अधोरेखित करत राहिली.
-भक्ती
पैस
बहावा

रसप्रिया

मोहिनीराज कुलदैवत असल्यामुळे नेवासे येथे बरेच वेळा जाणे होते.या मंदिराचा जीर्णोद्धार होळकरांचे दिवाण गंगोबा तात्या चंद्रचूड यांनी केला.तत्कालीन सरन्यायाधीश यांचे पुर्वज आणी पेशवाईतील एक बडे प्रस्थ. कनेरसर, हे चंद्रचूड यांचे मुळगाव. तीथे यांचा मोठा भुईकोट किल्लयासारखा वाडा आहे. प्रथमदर्शनी याची बनावट शनिवारवाड्या सारखी दिसते. बरेच वेळा या वाड्यात जाण्याचा योग आला.
भक्ती,याच रस्त्यावर , नेवासा पासून दहा बारा कि मी वर,गंगापूर येथे भव्य व सुदंर दत्त संस्थान आहे. हायवेवर गंगापूर फाटा,पाच कि मी आत मधे. येथील पेढे व नारळ बर्फी खुपच चविष्ट आहे. जाल तर जरूर खाऊन बघा. अर्थात दत्त मुर्ती सुद्धा
एकच गोष्ट खटकते.
मंदीर व्यवस्थापनाला सुद्धा तक्रार करून झाली आहे तरीही त्या मद्दड लोकांच्या डोक्यात हे काही शिरत नाही.
पैसाचा खांब ते सरळ सरळ पैशाचा खांब करून टाकतात.
ज्या खांबाला टेकून माऊलींना वैश्विक पसायदान मागितलं, त्या खांबाशेजारी दानपात्राची ती गलिच्छ पेटी ठेऊ नका अशी माफक अपेक्षा आहे. म्हणजे बघा, हा माऊलींचा अपमान आहे. अमूल्य ज्ञानाची गंगा माऊलींनी या खांबाजवळ महाराष्ट्रात वाहती केली. मराठीला, मराठी संस्कृतीला जे वैभव माऊलींनी दिले, त्याचे मोल कसे करू शकतो आपण? मग अशी अलौकिक, अनमोल घटनेचा प्रत्यक्ष साक्षी आहे त्याशेजारी आपली कुबडी दानत दाखवायला दानपेटी ठेऊन भीक मागणे जरातरी शोभते काय? तेही अगदी खांबाला खेटून. कशी बुद्धी चालते अशी?
खांबाला समोर करुन, पैशाचा पेटी बघवत नाही. ज्ञानेश्वरांचं महत्त्व समजायला पाहिजे लोकांना. श्री ज्ञानेशांच्या पवित्र चरणांनी पावन झालेली ही नगरी आहे. ज्ञानेश्वरांनी या खांबाला पाठ टेकून लेखन केले तो काळ आणि ते भगवद्गीतेचं ज्ञान सामान्यांना व्हावं, या हेतूने ते केलेलं लेखन आहे, नेवासे हे ज्ञानेश्वरीचं लेखनस्थळ आहे. नेवासा नगरीचं कौतुक ज्ञानेश्वरीतच आहे. पावित्र्य जपलं पाहिजे.
ऐसे युगी वरी कळी । आणि महाराष्ट्र मंडळी
श्री गोदावरीच्या कुळी | दक्षिणिली
तेथ महेशान्वय संभृते । श्रीनिवृत्तनाथ
केले ज्ञानदेव गीते । देशीकार लेणे (ज्ञा.अ. १८ वी ओवी)
गाव जवळ असल्यामुले नेवाशाला जाणे येणे असते. नदीमुळे विभागल्यामुळे दोन नेवासे पूर्वी होते. मोहनीराजाचे नेवासेही म्हणून नेवासे प्रसिद्ध होते. लीळाचरित्रातही नेवाशाचा उल्लेख येतो. चक्रधरस्वामी नेवाशाला यायचे. नेवाशाबद्दल सविस्तर लेखन आलं पाहिजे. खांबावरील लेखन संस्कृत आहे, तेलवाती सुरु राहीली पाहिजे. आणि शेवटी, शापाशिर्वाद आहेत.
वाचन हुडकायला बरेच संदर्भ तपासावे लागले. देव, तुळपुळे, माटे यांच्या ग्रंथात ह्या लेखाचा उल्लेख नाही मात्र श्री. महेश तेंडुलकरांच्या 'शिलालेखांच्या विश्वात' ह्या ग्रंथात ह्याचे वाचन आढळले ते याप्रमाणे
ओन्नम : [कर] वीरेश्वराय । पिता
महेन यत्पूर्व [दत्तं] षट्कं जगद्गुरोः [जगद्गुरो]
अखंडवर्त्ति तैलार्थ प्र
तिमासं सदा हि तत् । [रूपका]
णां षट्क संख्या देया आचंद्रसू
र्यकं । [ यः स्वी] करोति दुष्टः [सः ] तस्य
पूर्वे व्रजंत्यधः । मंगल महाश्रीः ।।
१. अर्थ : ॐ करवीरेश्वरास नमस्कार असो. पूर्वी माझ्या पितामहाने [ वडिलांनी] जगद्गुरूस दरमहा अखंड तेलवातीसाठी [नंदादीप सतत तेवत ठेवण्यासाठी] जे सहा रुपये दिले तेच सहा रुपये [आकाशात] चंद्रसूर्य असेपर्यंत देण्यात यावेत. जो त्यांचा अपहार करील तो दुष्ट होय, त्याचे पूर्वज नरकात जातील. महाश्री [मोहनीराज ] मंगल करो...
अर्थात हा लेख कालोल्लेखविहिन आहे. श्री गुप्ते यांनी याचे वाचन केले. मात्र त्यांनी रुपका हा तिथे नसलेला शब्द तिथं नष्ट झालेला असल्याने ठशांच्या आधारे अंदाजे दिला आहे मात्र त्याचा अर्थ रुपया लावला आहे तो त्यानुसार हा लेख बहुधा पेशवेकालीन असावा असे दिसते किंवा रुपका म्हणजे रुपये नसून चांदीची नाणी असावीत असेही असू शकते.
नेवासा :
या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे गावात आहे असे समजले जाते. याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे.
No comments:
Post a Comment