सोलापुर जिल्ह्यातील करमा़ळा हे तालुक्याचे प्रमुख गाव आहे. बहामनी साम्राज्याची गोवळकोंडा, बेरार, विजापुर, अहमदनगर अशी शकले झाली. तेव्हा हा करमाळा परिसर अहमदनगरच्या सुलतानाकडे आला. करमाळा या नावाची उत्पत्ती करम -ए-मौला अशी मुस्लिम शब्दावरुन आली आहे. सूफी संत करमेमौला हे करमाळा येथे वास्तव्य करून होते. या सूफी संताच्या करमेमौला या नावावरून या गावाला करमाळा नाव पडले असे सांगितले जाते. करमाळा हे निंबाळकर घराण्याच्या जहागिरीचे गाव! रंभाजीराव (रावरंभा) निंबाळकर हा शिवाजीमहाराजांच्या जावयाच्या पुढील वंशजांपैकी होता. मराठ्यांचा इतिहास हा पराक्रमासोबतच अंतर्गत कलह आणि उच्च-नीचतेचा भेदभाव यानेच जास्त गाजलेला आहे. मनगटाच्या जोरावर गाजविलेल्या तलवारीपेक्षा जन्माने मिळालेले श्रेष्ठत्व मोठे होते. म्हणूनच रानावनात लपवून ठेवलेली माणसं छत्रपती झाली तर केवळ कुळाचा दोष काढत सरदार महादजी शिंदे किंवा रावरंभा निंबाळकर यांसारख्या कर्तृत्ववान लोकांना मराठ्यांनी पाहिजे तो सन्मान कधी दिलाच नाही. नेहमी निजामशहा किंवा आदिलशहाकडे चाकरी करणा-या निंबाळकर घराण्याने रावरंभाला आपलं कधी मानलं नाही. मराठेशाही तोलून धरणा-या महादजी शिंदे व त्यांच्या पुढील पिढीला जे वैभव लाभलं ते हैदराबादची निजामशाही एकखांबी तंबूवर तोलून धरणा-या रावरंभाला पुढे मिळालं नाही. परंतु त्याने रावरंभाची योग्यता कमी होत नाही. इतिहासाची विनंती एकच आहे, माणसाच्या जन्माचा नाही तर कर्माचा विचार करा.
फलटणचे निंबाळकर घराणे म्हणजे शहाजीराजे ते संभाजीराजांचे मातृकूळ. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे सासर असूनही स्वराज्याच्या उभारणीप्रसंगी निंबाळकरांनी मुस्लिम सत्ताधीशांच्या चाकरीत धन्यता मानली. तरीपण स्वतंत्रपणे तलवार मारणा-या रावरंभाकडे नेहमी वेगळ्या चष्म्यातून पाहिले. शिवरायांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकरांचे पुत्र महादजीला संभाजीराजांच्या बहीण सखूबाई दिल्या होत्या. याच महादजीचा नातू बाजी निंबाळकरांपासून रंभाजीचा जन्म झाला. औरस, अनौरस या वादामुळे रंभाजीच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजीची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली. १७०७ ला औरंगजेबाच्या निधनानंतर मराठ्यांची गादी ही सातारा आणि कोल्हापूर अशी विभागल्याने अंतर्गत कलह वाढल्याने चंद्रसेन जाधव, हिंमतबहाद्दुर उदाजी चव्हाण, नेताजी शिंदे, मानाजी फाकडे व रंभाजीसारखे सरदार निजामाला जाऊन मिळाले. त्यामुळे निजामाचे आसन स्थिर झाले व त्याने रंभाजीला रावरंभा ही पदवी आणि ५२ लाखांची जहागिर दिली. रावरंभा घराण्यात रंभाजी, जानोजी, आनंदराव, बाजीराव, खंडेराव यांच्यासारख्यांनी शेवटपर्यंत निजामशाही तोलून धरली. प्रत्येकाला रावरंभा पदवी असल्याने या घराण्याच्या अभ्यासात बराच गोंधळ उडतो.
करमाळा हे गाव राव रंभा निंबाळकर यांना जहागिरीच्या रुपात १७२७ ला मिळाले. तेव्हापासून 'करमाळयाचे निंबाळकर' प्रकाशझोतात आले. सातार्याचे छत्रपती शाहु आणि कोल्हापुरच्या ताराराणी यांच्या वादामुळे रावरंभा मोघलांना जाउन मिळाले. इ.स.१७०७ च्या पुरंदरच्या लढाईत रावरंभा निंबाळकर निजामाचे सेनापती होते. या लढाईत त्यांनी बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पराभव केला. याबद्दल त्यांना 'रावरंभाजी निजाम ए मुल्क' हा किताब आणि पुणे प्रांताची जहागिरी दिली. या नव्या जहागिरीची देखभाल करण्यासाठी बाजी कदम यांना नेमले, पण थोड्याच अवधीत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी बाजी कदम यांना आपल्याकडे वळवून घेतले, छत्रपती शाहूंनी निजामाला पटवून दिले कि पुण्याची जहागिरी वंशपरंपरेने आपल्याकडे आहे. तीच्यावर इतरांचा हक्क पोहचत नाही. त्यामुळे निजामाने रावरंभा याला करमाळयाची जहागिरी दिली. निंबाळकरांनी करमाळयाला तसेच माढ्यालाही किल्ला बांधला. इ.स. १७९५ च्या लढाईत निजामाचा पराभव झाला आणि साराच प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आला. यथासमय तो ब्रिटिशांच्या ताब्यात आला. आणि मग निजामाने मराठवाड्याच्या लढाईत उस्मानाबाद ( धाराशीव जिल्ह्यातील ) भुमची जहागिरी निंबाळकरांना दिली.
रावरंभाकडे पुणे, बारामती, श्रीगोंदा, तुळजापूर,माढा, करमाळा आणि भूमची जहागिरी होती. निजामाच्या १२ मुख्य जहागिरदारांत रावरंभाचे स्थान वरचे असल्याने हैदराबादमध्ये रावरंभाची स्वतंत्र देवडी (कचेरी) होती तर औरंगाबादमधील जुन्या हायकोर्टालगतच्या आजच्या कोटला कॉलनीत रावरंभा बाजीरावाची हवेली होती.
रावरंभा घराण्यातील प्रत्येक पुरुष हा तलवार, कला, साहित्य, स्थापत्य यात रुची ठेवणारा होता. त्यापुढेच तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारासह, आतील ओव-या, माढा आणि करमाळ्यातील देवीची मंदिरे आदी त्यांच्या निर्मितीचे साक्षीदार आहेत. साखरखेर्डा, भालकी, फत्तेखेर्डा, राक्षसभुवन आणि उदगीर या लढाईतील रावरंभाचे योगदान विसरता येणार नाही. आज परंड्याच्या किल्ल्यावर दिसणारी तोफ जानोजी जसवंतराव रावरंभानेच पेडगावहून आणून बसविलेली आहे. महादजी शिंदे, बडोद्याचे फत्तेसिंग गायकवाड, सेनापती धनाजी जाधवांचे घराणे, कोल्हापूरचे छत्रपती, सरदार थोरात घराण्याशी रावरंभाचे वैवाहिक संबंध होते.
रावरंभा निजामाकडे असले तरी त्यांचे पेशव्यांबरोबर चांगले संबंध होते. किंबहुना त्यांच्यासारख्या सरदारामुळेच निजामाला मराठ्यांविरोधात एकाही लढाईत विजय मिळाला नाही. मराठ्यांबरोबरच रावरंभाचे इंग्रज, फ्रेंच यांच्यासोबतही चांगले संबंध होते. एकदा तर रावरंभाने निजामाला सोडून जाण्याची भाषा करताच राजा असूनही डोळ्यात पाणी आणून निजामाला रावरंभाकडे विनंती करावी लागली. यावरून त्यांची योग्यता स्पष्ट होते. एकही लढाई न करता निजामाने मराठ्यांशी केवळ तह करून २०० वर्षे राज्यकारभार केला; परंतु प्रत्येक लढाईने रावरंभाची जहागिर कमी होत गेली.तरीपण तुळजापूर, माढा, करमाळा, रोपळे, शेंद्री, भूम येथील विविध इमारती रावरंभाच्या वैभवाची साक्ष देऊन उभ्या आहेत.
पहिले रावरंभाचे वास्तव्य करमाळ्यात तर शेवटचे रावरंभा भूम (जि. उस्मानाबाद) या ठिकाणी राहिले. त्यांना गोजराबाई व ताराबाई या दोन मुली असून ताराबाई पुढे विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. सध्या रावरंभा घराण्याचे वंशज म्हणजे विजयसिंह थोरात हे असून ते भूमला राहतात. तर रावरंभाच्या भावाचे वंशज शेंद्री (ता. बार्शी) व रोपळे (ता. माढा, जि. उस्मानाबाद) येथे राहतात. तुळजाभवानीदेवीच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘सरदार निंबाळकर दरवाजा’ नाव दिले गेले तेही रावरंभावरूनच. अशा रीतीने सर्वच क्षेत्रांत नावाजलेल्या रावरंभाची कारकीर्द गाजली ती म्हणजे त्यांच्या कलासक्त स्वभावामुळे.

रावरंभा यांच्या समोर नृत्य सादर करताना माहेलका
रावरंभा निंबाळकरांमध्ये रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दुर हे एका नर्तकीच्या प्रकरणावरून फारच गाजले. हैदराबादच्या निजामाची राजवट म्हणजे निव्वळ बाबशाही. त्यामुळे नाचगाण्याचा थयथयाट झाला.सातवा निजाम मीर उस्मान अली खानचे सहा विवाह झाले शिवाय इतर ४२ स्त्रिया जनानखान्यात होत्या. त्यातून त्याला ५० मुले व ४४ दासीपुत्र झाले. हे उदाहरण फार बोलके आहे. चमेली, बिजली, लैला यांसारख्या नर्तकी असायच्या. परंतु त्या कालखंडात हैदराबाद संस्थानात अतिशय प्रसिद्ध अशी नर्तकी आणि गायिका होती. तिचे नाव होते माहलिका ऊर्फ चंदा. तिच्या गाण्यावर निजाम, दिवाणापासून अनेक सरदार फिदा होते. परंतु माहलिकाची मर्जी होती ती रावरंभावर. माहलिकाची बिदागी ही सर्वसामान्याला परवडणारी नव्हती. माहलिकाकडे स्वतंत्र कोठी असून रावरंभाकडून तिला प्रतिमाह तीन हजारांची बिदागी मिळत होती. अप्रतिम लावण्य, गायन आणि नृत्यात पारंगत असणा-या माहलिकाकडे गडगंज संपत्ती होती. गुलाम हुसेनखानाने ‘तारिखे-गुल्जारे आसफिया’ नावाच्या ग्रंथात रावरंभा आणि माहलिकाचा वर्णिलेला किस्सा मनोरंजक आहे.
१० फेब्रुवारी १७८२ ला पुण्यामध्ये सवाई माधवरावांचा शाही विवाह असल्याने देशभरातील राजा-महाराजांसह अनेक नामांकित लोकांनी हजेरी लावली होती. पूर्वी विवाह हे ३०-४० दिवस चालायचे. शाही विवाहामध्ये तर नाच-गाणे, विविध खेळ, मनोरंजनाबरोबरच विविध बाजार भरायचे. नाच-गाण्याकरिता तर देशभरातील सुप्रसिद्ध नर्तकींनी आपली हजेरी लावली होती. त्या वेळी खरं तर सर्वत्र व्यंकटनरसी नावाच्या नर्तकीचा बोलबाला होता. परंतु महालिकेने सर्वांना मागे टाकत पुणे गाजविले. साहजिकच सर्वत्र माहलिकाची चर्चा झाली. लग्नसमारंभानंतर वराती मंडळी बाजारहाट करण्याकरिता बाहेर पडली. मराठा कालखंडात बाजारात सर्वांत मोठी गर्दी ही घोड्याच्या बाजारात व्हायची. त्यानुसार नाना फडणीसासह अनेक नामांकित लोक या बाजारात फिरत असताना सर्वांची नजर ६ घोडे घेऊन आलेल्या व्यापा-यावर
स्थिरावली. अफगाणी जातीचे पांढरेशुभ्र घोडे खरंच मोठे देखणे होते. नानामुळे तेथे मोठी गर्दी ही घोड्याच्या बाजारात व्हायची. त्यानुसार नाना फडणीसांसह
अनेक नामांकित लोक या बाजारात फिरत असताना सर्वांची नजर ६ घोडे घेऊन आलेल्या व्यापा-यावर स्थिरावली. अफगाणी जातीचे पांढरेशुभ्र घोडे खरंच मोठे देखणे
होते. नानांमुळे तेथे मोठी गर्दी वाढली. थोड्याच वेळात घोड्याच्या खरेदीसाठी बोली लागली. शे- दोनशेचे घोडे पण नानांनी त्यावर दीड हजार लावले. अवास्तव किंमत आणि खुद्द नानांची बोली लागल्याने कोणीच पुढे आले नाही. बोली एकवार, दोनवार आणि तीनवार... व्हायच्या आत गर्दीतून आवाज आला दोन हजार रुपये.... सर्वांच्या नजरा आवाजाकडे वळल्या आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एका नर्तकीने पेशव्यांना मागे टाकून २ हजाराने ६ घोडे घ्यावेत हे आश्चर्यकारकच होते. न राहून नाना स्वत: माहलिकेच्या जवळ आले आणि त्यांनी तिला प्रश्न केला, तुला कशाला हवेत घोडे? तेव्हा माहलिकेचे उत्तर ऐकून सर्वांचेच डोके सुन्न झाले, कारण माहलिका म्हणाली, हे सर्व घोडे मी माझ्या प्राणप्रिय रावरंभासाठी घेतले आहेत.
पुढे माहलिका-रावरंभाचे संबंध अधिकच दृढ होत गेले. त्यामुळे तिच्यावर जळणा-यांनी अनेक कट-कारस्थाने रचून तिला देशद्रोही बनवून अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु निजामाने रावरंभाला जवळ बोलावून शहानिशा करून घेतली. रावरंभावर जिवापाड प्रेम करणा-या माहलिकेने रचलेल्या कविता पुढे प्रचंड गाजल्या. त्यातील काही पंक्ती किती बोलक्या आहेत.
‘हरम को बनाये है बल दैर दिल में।
तुझे जबसे हम अय सनम देखते है।’
अशा या नामांकित माहलिकेने हैदराबाद या ठिकाणी इ.स. १८२४ साली रावरंभाचा आणि जगाचा निरोप घेतला. इकडे शंभर वर्षांहून अधिक काळ रावरंभा किताब मिळविणा-या या घराण्याचे दिवसही आता फिरले. इ.स. १८०० साली निजामाने इंग्रजांशी तह करून तैनाती फौज स्वीकारली. निजामाने दिवाणाला बडतर्फ करून सर्व संस्थानिक सरदार व जहागिरदारांना नाममात्र पगारीवर आणले.
साहजिकच जड अंत:करणाने आपले आवडते शहर हैदराबादचा निरोप घेतला. खड्र्याच्या लढाईमुळे अगोदरच करमाळा त्यांच्या ताब्यातून गेल्याने भूम येथे छोटीशी जहागिरी राहिली होती. शेवटचे वास्तव्य त्यांचे तेथेच असून इ.स. १८५७ साली रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दर निंबाळकराने जगाचा निरोप घेतला. आज हैदराबादमध्ये माहलिकाची कबर तर भूम (जि. उस्मानाबाद) येथे रावरंभाची समाधी आहे. पराक्रमी माणसाची कलाआसक्ती आणि निजाम व पेशवेकालीन स्त्री-पुरुष संबंधावर हा प्रकाशझोत आहे.
आजही माहलिकेचे प्रतीक म्हणून करमाळ्याच्या कमलादेवीच्या छबिन्यापुढे नाचण्याचा मान तिथल्या मूळ मुसलमान घराण्याकडे असून त्याकरिता इनाम जमीन आहे. निंबाळकर घराण्यात स्वकर्तृत्वाने पुढे आलेले रावरंभा हे एकमेव घराणे असूनही त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळालीच नाही. परंतु आजही आपण करमाळा शहरात पाऊल ठेवलं की समोर त्यांनी बांधलेले कमलादेवीचे भव्य मंदिर दिसते आणि तोंडात या ओळी येतात-
करमाळं शअर काई वाजत जाई जाई।
तिथं नांदती अंबाबाई।।
करमाळं शअर... रावरंभाचं वतयन
महादेवाचा छबिना जातो मारोतीवरणं।।

अशा या पराक्रमी रावरंभा निंबाळकर च्या संस्थापकाचा मृत्यू माढा याठिकाणी झाला. तेथे त्यांची भव्य अशी समाधी आहे. मात्र त्यांच्या मृत्युची निश्चित तारीख अद्याप उपलब्ध नव्हती. ती सापडली असून पेशवे दफ्तरातील खंड क्र. २२, पत्र क्र.३४२ , पान क्र. १७८ वर त्यांच्या मृत्युची तारीख १७ नोव्हेंबर १७३६ म्हणजेच कार्तिक वद्य एकादशी याप्रमाणे आहे. इतिहासात काम करत असताना जनतेने दिलेला प्रतिसाद ही आपल्या कामाची पावती आहे.
करमाळा भुइकोट :-
करमाळ्याचा भुइकोट एसटी आगारातून चालत ५ मिनिटावर किल्ला आहे. खरं बघितला तर पूर्ण गाव किल्ल्याचा तटबंदीच्या आत, बाहेर बसला आहे. त्यामुळे आपल्याला सगळे अवशेष शोधायला लागतात. किल्ल्याची तटबंदी आणि काही बुरुज ढासळायला लागले आहेत. करमाळा भुईकोटाचे बांधकाम रावरंभा निंबाळकर व त्यांचे पुत्र जानोजीराव यांनी इ.स. १७२७ - १७३० या कालावधीत केले. सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने ऐतिहासिकदृष्टीने करमाळा किल्ल्याला खूप महत्व होते. हैदराबादच्या निजामाचे सरदार रावरंभा निंबाळकर यांच्याकडे असलेल्या जहागिरीत बीड, उस्मानाबाद, जामखेड, खर्डा, भूम, कर्जत, करमाळा या प्रदेशांचा समावेश होता. करमाळा शहर म्हणजे रंभाजीराव निंबाळकर यांच्या जहागिरीमधील मुख्य गाव होय.दक्षिणोत्तर असलेला अंडाकृती आकाराचा हा किल्ला १५ एकरवर पसरलेला असुन या गडाच्या तटबंदीत गोलाकार एकोणीस व मुख्य दरवाजा शेजारी अष्टकोनी दोन असे एकूण एकवीस बुरूज आहेत. किल्ल्याच्या बुरुजावर व तटावर विटांनी बांधलेल्या सुंदर चर्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीने संपुर्ण गावाला आपल्या कवेत घेतले आहे पण किल्ल्यात असलेल्या गावानेच या किल्ल्याचा घास घेतला असुन आत वाढत असलेल्या वस्तीने किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे. किल्ल्याचे दगड घरांच्या बांधकामासाठी वापरले गेले असुन गावाचा आकार वाढतच असल्यामुळे किल्ल्याचे अवशेष अतिक्रमणात लुप्त होत चालले आहेत.
करमाळा किल्ल्याचा मुख्य दरवाजा (डावीकडील, आतील भाग
करमाळा किल्ल्याचे विविध दरवाजे
करमाळा किल्ल्याची तटबंदी

करमाळा किल्ल्याची तटबंदी
![]() |
| करमाळा किल्ल्याचा मुख्य दरवाजा (डावीकडील, आतील भाग ) आणि आतील दरवाजा आणि त्यांचा समोर असलेला मारुतीच मंदिर |
आतील दरवाजा आणि त्यांचा समोर असलेला मारुतीच मंदिर
![]() |
| पायरची विहीर आणि खाली फोटोत कोपऱ्यात असलेली ब्रह्मदेवाची प्राचीन मूर्ती |
ब्रह्मदेवाची प्राचीन मूर्ती

करमाळा किल्ल्याचा आतील दरवाजाचा बुरुजावरून दिसणारं दृश्य
बारव” – हीचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करतात
![]() |
| मारवाडी गल्लीतून गेलो असता मला दिसलेल्या मूर्ती आणि वास्तू |
![]() |
| मारवाडी गल्लीतून गेलो असता मला दिसलेल्या मूर्ती आणि वास्तू |
![]() |
| मारवाडी गल्लीतून गेलो असता मला दिसलेल्या मूर्ती आणि वास्तू |
किल्ल्याच्या तटबंदीची मोठया प्रमाणात पडझड झाली असल्याने तटबंदीवरुन सलगपणे फिरता येत नाही व तटबंदीच्या कडेने फेरी मारावी लागते. बाहेरून पाहताना किल्ल्याचे बुरुज जरी भक्कम वाटत असले तरी आत मात्र तटबंदी आणि बुरुज पोखरलेले आहेत. किल्ला नीटपणे पाहायचा झाल्यास स्थानिक लोक वेस म्हणुन ज्या भागाला ओळखतात तेथुन किल्ला पहाण्यास सुरवात करावी. वेशीतील पूर्वेकडील दरवाजाने किल्ल्यात शिरताना उजव्या हाताने थोडेसे पुढे गेल्यास एक दगडी बांधकामाची भिंतीत नक्षीदार कोनाडे असलेली पुष्कर्णी दिसुन येते. हि पुष्कर्णी पाहून परत आल्यावर किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीत असलेल्या पुर्वाभिमुख दरवाजातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. आत शिरल्यावर समोरच वेशीवरील मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराजवळ काही उध्वस्त प्राचीन मुर्त्या, भग्न वीरगळ आणि सतीच्या दोन शिळा पहायला मिळतात. मारुती मंदिराच्या समोरच किल्ल्याचे दगडात बांधलेले उत्तराभिमुख प्रवेशव्दार असून त्याच्या वरील बाजुस तोफेच्या मारगिरीसाठी वीटांनी बांधलेले ३ झरोके आहेत. किल्ल्याचा लाकडी दरवाजा आणि त्यावरील लोखण्डी खिळे आजही शिल्लक असुन प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस अष्टकोनी बुरुज आहेत. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या या भागाला अधिक संरक्षण मिळावे यासाठी येथे मुख्य कोटाबाहेर परकोटाची रचना केलेली आहे. या परकोटात उजव्या बाजूला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे (खोलेश्वर) मंदिर पाहावयास मिळते. यातील ब्रम्हाच्या मंदिराचे मस्जिदमध्ये रुपांतर झालेले असुन विष्णुमंदीर अलीकडील काळातील तर शिवमंदीर मध्ययुगीन आहे. या परकोटाच्या बाहेरील बाजुस बांधीव खंदक असुन सध्या त्याचे रुपांतर सांडपाण्याच्या नाल्यात झाले आहे. पुर्वी संपुर्ण किल्ल्यालाच खंदक असावा पण काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. किल्ल्याच्या या बाजुचा बाहेरील रस्ता खंदक रोड म्हणुन ओळखला जातो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे ध्वजस्तंभ असुन खुप मोठया प्रमाणात झुडुपे वाढलेली आहे. या भागातुन किल्ल्यात वसलेले गाव पसरलेली तटबंदी आणि बुरुज दिसतात. किल्ल्याचे बहुतेक अवशेष तटबंदी शेजारी असल्याने फक्त तटबंदी वरून फेरफटका मारून देखील किल्ला पहाता आला असता पण अनेक ठिकाणी तटबंदी ढासळलेली असल्याने ते शक्य होत नाही. दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला चालत गेल्यावर एक मोठी बांधिव बारव आहे. या बारवमध्ये उतरण्यासाठी दोन बाजूने पायऱ्या असुन काठावर कमानी असलेला छोटेखानी महाल आहे. उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी पाण्याशेजारी जमिनीखाली हा महाल बांधला गेला असावा. या महालातून जानोजीरावांच्या महालात जाण्यासाठी भुमिगत रस्ता असल्याचे सांगितले जाते. सध्या या बारवचा उपयोग कचरा टाकण्यासाठी व गणेश विसर्जनासाठी केला जातो.या बारवच्या उजव्या बाजुला तटबंदीलगत एक पिराची कबर आहे. बारव पाहून रस्त्याने पुढे चालत गेल्यावर रावरंभा निंबाळकर यांनी बांधलेला राजवाडा असून सध्या इथे कोर्टाची इमारत इतर सरकारी कार्यालय आहेत. आयताकृती आकाराच्या या राजवाडयात मध्यभागी असलेल्या अंगणात एक विहिर आहे. वाडयाच्या मागील बाजूस बाहेर जाण्यासाठी एक लहान दरवाजा आहे. इथुन पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाच्या तटबंदीत असलेल्या दरवाजापाशी पोहोचतो. याठिकाणी दुहेरी तटबंदी असुन बाहेरील तटबंदीत असणारा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. दरवाजातून बाहेर पडून तटबंदीच्या कडेकडेने चालताना आपल्याला खंदकात असलेली विहिर तसेच एक चोर दरवाजा दिसतो.किल्ल्यात असणारी वस्ती आणि घाण यामुळे बाकीचे किल्ल्याचे अवशेष पाहाण्यासाठी तटबंदी व बुरुजाच्या कडेकडेने फ़िरावे लागते. यातील बऱ्याच बुरुजांच्या आतील भागात खोल्या असुन बुरुजावर जाण्यासाठी अंतर्गत जिने आहेत. किल्ला पूर्ण पाहायला एक ते दीड तास पुरेसा आहे.
सातविहीर
सात नाल्याची किंवा सात विहीर, करमाळा
करमाळा हा भागसुध्दा दुष्काळी, पाऊस हा 500 मि.मी च्या आसपास पडणारा, तापमान 45 अंश सेंटिग्रेटपर्यंत जाणारे, शुष्क हवा, हलकी जमीन असलेला आणि सीना ह्या तुटीच्या खोऱ्यातला आहे. त्या ठिकाणच्या उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थेवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. किल्ल्याच्या पश्चिमेकडे एक मोठा तलाव आहे. त्या तलावाला लागूनच एक सात विहीरींची बारव आहे. या बारवेचा आकार १५० - २०० फूट व्यासाचा आहे. तिची खोली ७० -८० फूट असावी. त्या विहीरीमध्ये परत सात विहीरी आहेत आणि पाणी हे जमिनीला काठोकाठ असे भरलेले असते. ही मोठ्या आकाराची प्रचंड विहीरी, विहीरखोदाईच्या शास्त्रातील आश्चर्य मानायला काही हरकत नाही. ती कढईच्या आकाराची आहे. ज्या लहानशा नाल्यावर हा तलाव बांधलेला आहे तोच नाला पुढे खंदकाला पाणी पुरवठा करतो. या सात विहीर नावाच्या मोठ्या विहीरीवरून करमाळा गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अलिकडे म्हणजे अगदी १९६० पर्यंत होत होता असे कळते. विहीरीपासून काढलेल्या एका नलिकेद्वारे पाणी पुरवठा केला जात असे. त्याला पुढे हौदाची मालिका जोडलेली आहे. ही व्यवस्था आजसुध्दा उध्वस्त झालेल्या अवस्थेत आपणास दिसते. दोन माणसाद्वारे किंवा रहाटाचा उपयोग करून या नलिकेला (पाईपलाईनला) सातत्याने पाणीपुरवठा केला जात होता असे सांगतात. अलिकडच्या काळात दूर अंतरावरून (सीना नदीतून) पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे ही सर्व जुनी ऐतिहासिक व्यवस्था आज वापरात नाही.
कमलाभवानी माता मंदिर, ९६ पायऱ्यांची बारव
करमाळ्याची कमलाभवानी देवी –
मोघली सरदार राव रंभाजी निंबाळकर यांनी कुलस्वामिनी कमला भवानीचे एक मंदिर बांधलेले असून ते करमाळा शहराजवळील एका टेकडावर आहे, कमला भवानीच मंदिर गावाच्या बाहेरील ओसाड अश्या माळावर आहे. याला देवीचा माळा असे म्हणतात.मंदिर गावातून २ किमी वर आहे. त्यामुळे खाजगी रिक्षा करून जायायला लागते किंवा एसटीने त्या मंदिराच्या फाट्याला उतरून ५ मिनटं लागतात. करमाळ्यावरून परांडा किंवा सालसचा दिशेने जाणाऱ्या एसटीने उतरावे. येथे लांबपल्याचा एसटी थांबत नाही.

१७ व्या शतकात बांधण्य़ात आलेले आहे हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसत आहे उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायऱ्यांची चढण आहे. मंदिर बांधणीचा विचार केला तर या मंदिर बांधकामात ९६ या आकडयाला फारच महत्व दिल्याचे स्पष्ट होत आहे कारण ७५ फुट लांबी व ६५ फुट रुंदीच्या या मंदिराची उभारणीच ९६ खांबावर असून मंदिरात जाण्यासाठी एकूण ९६ पायऱ्या आहे. मंदिरातील छतावर ९६ चित्र रेखाटले आहेत. अशा रीतीने एखाद्या मंदिराची उभारणी करताना जागोजागी ९६ अंकांचा वापर केल्याने करमाळय़ातील कमळादेवी मंदिर हे वैशिष्टय़पूर्ण ठरते. ९६ हा अंक मराठा कुळाशी निगडित आहे. त्यानुसार अंकशास्त्रीय दृष्टिकोनातून याचे अवलोकन केल्यास नऊ हा अंक परिपूर्ण जीवनाचे तर सहा हा अंक स्वत:च्या वैभवातून समाजाचा उत्कर्ष साधण्याचे द्योतक आहे. त्यामुळे रावरंभा निंबाळकराने करमाळ्याचे मंदिर बांधताना आपल्या वैभवसंपन्न जीवनाचा फायदा सर्वसामान्यांसाठी व्हावा व याकरिता कमळादेवी अथवा लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, ही भावना मनाशी बाळगली असेल, अशी शक्यता आहे.
मंदिर आणि बारवाकरिता लागणारा दगड आणि चुना कुठून आणला हे अद्याप स्पष्ट होत नाही. अठराव्या शतकातील रावरंभाचा वावर पाहता त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नव्हती. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सर्वात कर्तृत्ववान पुरुष म्हणून ख्याती लाभलेल्या रावरंभाला मात्र पाहिजे त्या प्रमाणात आपलेपण लाभले नाही.

मंदिर किल्ल्या एवढेच प्राचीन आहे. असं म्हणतात किल्ल्या बांधायचा आधी मंदिर निर्माण केलं होते. मंदिराभोवती उंच कोट चढविला असून मंदिर समोर एक सभामंडप आहे. नवरात्रात इथे भक्तांची रीघ लागलेली असते. हाती त्रिशूळ आणि तलवार हाती घेतलेल्या अष्टभुज कमला मातेची मूर्ती प्रसन्न असून, देवीच्या मंदिरासमोर आकाशात झेपावणाऱ्या एखाद्या मनोऱ्यासारख्या तीन मोठ्या दीपमाळा बांधल्या आहेत.
मूळ मंदिर चारही बाजूनी भक्कम दगडी तटबंदीनी वेढलेले आहे. तटबंदीच्या आतील बाजूस सुंदर दगडी ओवऱ्या आहेत आणि पूर्ण अंगणाला दगडी फरसबंदी केली आहे.
मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी फरशा असून तटभिंतीलगत भाविकांच्या सोयीसाठी ओवऱ्या काढलेल्या आहेत. विशेष म्हणजे या ओवऱ्यांची संख्याही ९६ आहे. स्वत: जानोजी निंबाळकर हे बऱ्याच वेळा याच ओवऱ्यात मुक्कामाला असत. त्यामुळे त्यांना भेटायला येणारेही याच ठिकाणी राहात असत. पेशवे दफ्तरातील ‘मुक्काम दरजागा कमलालये’ या नोंदीवरून पेशव्यांचा मुक्कामही या ओवरीत झाल्याचे स्पष्ट होते.

मंदिरच वैशिष्ट्य म्हणजे इथे चक्क दाक्षिणात्य शैलीशी मिळतीजुळती गोपुरे आपले मंदिर प्रांगणात स्वागत करतात. महाराष्ट्रातील खूप कमी मंदिरात अशी गोपुरे बघायला मिळतात. शैलीतील हा बदल खरतर पिढीतील बदलामुळे झालाय. मुख्य मंदिर बांधल (कदाचित जीर्णोद्धार केला) सरदार राजे रावरंभा ह्यांनी तर बाजूची तटबंदी आणि हि गोपुरे बांधली त्याच्या मुलांनी म्हणजे राजे जनकोजीनी. जनकोजी दक्षिणेच्या स्वारीवर असताना तिकडची मंदिरे आणि भव्य गोपुरे पाहून प्रभावित झाला आणि त्यांनी तिकडचे कारागीर करमाळ्यात आणून सुंदर गोपूर बांधून घेतली. एकाच मंदिरात पाच देवतांचे शक्तीपंचायतन असलेले करमाळ्यातील कमलाभवानी मातेचे मंदिर दुर्मीळ आहे तसेच कार्तिक स्वामीची मूर्ती देखील या मंदिरामध्ये पहावयास मिळेल. या शिवाय मुख्य मंदिराच्या समोर तीन गगनचुंबी गोपुरे आहेत. शहरामध्ये कोणत्याही बाजूने प्रवेश करताना दुरवरूनच देवी मंदिराचे स्थान दर्शविणारी ही गोपुरे उत्कृष्ट बांधणीची साक्ष देत उभी आहेत
मंदिराची शैली हेमाडपंथी आहे असा उल्लेख सगळीकडे असला तरी त्या शैलीची वैशिष्ट्ये ठळकपणे इथे पाहायला मिळत नाहीत जसे उंच जोते, मंदिराचा बाह्य आकार आणि त्यावरील नक्षीकाम इत्यादी ह्या मंदिरावर दिसत नाहीत. कदाचित हेमाडपंथी आणि इस्लामिक शैलीची सरमिसळ झाली असावी असे वाटते. दीपामाळांचा प्रकार हि पारंपारिक मराठी नसून बराचसा इस्लामिक प्रभाव असलेला वाटतो. एक शक्यता अशी वाटते कि मुळ मंदिर हेमाडपंथी शैलीतील असावे आणि जीर्णोद्धार निजामशाही काळात झाला असल्याने हि शैलीतील सरमिसळ झाली असावी. अलीकडच्या काळातच सुंदर अशा दगडी मंदिराला ऑइल पेंट फासून त्याच्या सुंदरतेला दृष्ट लागणार नाही ह्याची काळजी देवस्थान ट्रस्टने घेतलेली दिसती आहे.
मंदिरा समोर होमकुंड आणि मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत ८० फूट उंचीच्या तीन दीपमाळा असून त्या एवढय़ा भव्य आहेत की, त्यावर जाण्यासाठी आतील बाजूला पायऱ्या आहेत. दीपमाळेतील पायऱ्यांची संख्या ९६ च आहे. मंदिरापेक्षा दीपमाळेची उंची एवढी भव्य का ठेवली ते समजत नाही. शिवाय त्या एकाच रांगेत असल्याने त्याच्या संख्येचाही बोध होत नाही. दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या ज्वाला करमाळा जहागिरीतील संपूर्ण ९६ गावांतून स्पष्टपणे दिसत होत्या अशी दंतकथा आहे. चौथ्या दीपमाळेचा फक्त चबुतरा शिल्लक असून शंभरेक वर्षांपूर्वी वीज पडून ती दीपमाळ ईशान्येकडील दरवाजावर कोसळल्याने त्यावरील गोपुरही ढासळले.
मंदिराबद्दल आख्यायिका अशी सांगतात कि सरदार रावरंभा हा तुळजापूरच्या भवानी मातेचा निस्सीम भक्त होता वृद्धापकाळात त्याला तुळजापूरला दर्शनाला जाणे शक्य होईना म्हणून भवानीने त्याला दृष्टांत दिला कि मी तुझ्या मागे तुळजापुराहून करमाळ्याला येईन पण तू मागे वळून बघायचे नाही. रावरंभा गावाबाहेरील माळापर्यंत आला आणि त्याच्या मनात शंका आली. देवी खरच मागे येत आहे कि नाही हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले आणि देवी अंतर्धान पावली. त्याचठिकाणी हे मंदिर बांधले आहे. आता अशीच कथा मिरजेच्या अंबाबाई बद्दलहि ऐकायला मिळते, खरे खोटे ती भवानीच जाणे.
सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली ४.३ फुटाची काळ्या पाषाणातील भवानीमातेची मूर्ती अष्टभुजा आहे.हातात त्रिशूल आणि तलवार धारण केलेली अष्टभुजा मूर्ती डोळ्याचे पारणे फेडते. गर्भगृहातील देवी मूर्तीच्या वरच्या बाजूस उंच शिखर हे सहा स्तरांत असून त्यावर विविध देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. विशेष म्हणजे या शिल्पांची संख्याही ९६ आहे. शिखराच्या शेवटच्या भागात सहस्रदलाचे कमळ असून त्यावर मुस्लीम शैलीत घुमट व त्याच्या चारही बाजूला मीनार आहेत. त्यामुळे रावरंभाने मुख्य मंदिर बांधकाम शैलीतून हिंदू-मुस्लीम धर्मीयांमध्ये ऐक्य साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येतो. शिवाय ते मुस्लीम शासकाकडे चाकरीस असल्याने त्याची उतराई होणे हाही एक अर्थ अभिप्रेत होतो.
मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे गाभाऱ्यात श्री विष्णु-लक्ष्मिची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभाऱ्यात सुर्यानारायनाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.

माढा, करमाळा या ठिकाणी जहागीरदार असणाऱ्या रावरंभाची तुळजाभवानीवर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे करमाळ्यातील मंदिराची सर्व व्यवस्था तुळजापूरप्रमाणेच ठेवण्यात आलेली आहे. मूर्तीच्या बनावटीपासून ते देवीला तयार करण्यात आलेले दागिने सर्वकाही तुळजाभवानी देवीची प्रतिकृती आहे. तुळजाभवानीला छत्रपती शिवरायांनी अर्पण केलेली १०१ मोहोरांची माळ असून त्याचीच आवृत्ती करमाळ्यात केलेली आहे. तुळजापूरप्रमाणेच येथेही देवीचा पुजारी जातीने मराठा समाजातील आहे. तर इतर सेवेकऱ्यांची संख्या जवळपास २८ आहे. विशेष म्हणजे या सर्वाना रावरंभाने त्या काळी ज्या जमिनी दान दिलेल्या आहेत त्या आजतागायत कायम आहेत.
इतर देवी मंदिरांप्रमाणेच कमळादेवीचा नवरात्र महोत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा होत असतो. परंतु कमळादेवीची मुख्य यात्रा भरते ती म्हणजे कार्तिक पौर्णिमेपासून चतुर्थीपर्यंत. या दिवशी रोज छबिना निघतो, परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला निघणारा छबिना जरा वैशिष्टय़पूर्ण असतो. रात्री १२ वाजता थोरल्या हत्तीच्या वाहनाच्या अंबारीत निघालेल्या छबिन्यासाठी सेवेकरी, मानकरी मोठी गर्दी करतात. ‘बडी जे महेरबान’, ‘बडी सवारी आ रही है’ अशा हिंदीतील घोषणेबरोबरच आई राजा उदोऽऽ उदोऽऽचा जयघोष सुरू असतो.
कमळादेवीच्या या छबिन्याचे वैशिष्टय़ म्हणजे रात्रभर चालणाऱ्या छबिन्यापुढे मुस्लीम समाजातील नर्तकीचे नृत्य सुरू असते. रावरंभाचे हैदराबादमधील महालिका नावाच्या नर्तकीवर मनापासून प्रेम होते. त्याचे प्रतीक म्हणून कमळादेवीच्या छबिन्यापुढे मुस्लीम समाजातील नर्तकी नृत्य सादर करीत असते. करमाळ्यातील मुस्लीम समाजातील जी नर्तकी म्हणून छबिन्याचा मान घेणार आहे, तिला रीतसर लग्न करता येत नाही. या नर्तकीला काही रावरंभाने जी जमीन दान दिली आहे ती आजतागायत रुजू आहे. रात्री बारा वाजता वाजतगाजत निघालेला छबिना देवी मंदिराच्या बाजूला असणाऱ्या खंडोबाच्या मंदिराकडे जाऊन तेथे देवीच्या वतीने खंडोबाला भर पेहरावाचा आहेर केला जातो. पहाटे पाच वाजता छबिना परत येतो. खंडोबा म्हणजे शंकराच्या गणापैकी एक असून तो देवीचा रक्षणकर्ता आहे. चंपाषष्ठीला खंडोबाच्या वतीने देवीला साडी-चोळीचा आहेर दिला जातो. अशा रीतीने करमाळय़ातील ९६ कुळी देवीचे मंदिर म्हणजे तुळजाभवानीची प्रतिकृती म्हणावी लागेल, परंतु फक्त बांधकामाचा विचार केल्यास ते तुळजापूरपेक्षा वरचढ आहे म्हटल्यास वावगे होणार नाही.
खडर्य़ाच्या लढाईनंतर करमाळ्यातील रावरंभाची जहागीर मराठय़ांकडे आल्याने रावरंभाला भूमकडे प्रयाण करावे लागले. आजच्या घडीला बार्शीजवळील शेंद्री, माढा तालुक्यातील रोपळे व भूम येथील थोरात घराणे हे रावरंभाचे वारसदार असून त्यांनी बांधलेल्या गढय़ांची मोठी पडझड झालेली असली तरी करमाळय़ातील कमळादेवी मंदिर आजही अतिशय सुव्यवस्थित आहे हे विशेष आहे.
करमाळ्यावर पुढे इंग्रजांचा अंमल सुरू झाल्याने मंदिर प्रशासनात त्यांनी सुसूत्रता आणली. प्रत्येक सेवकाला सनदा देऊन त्यांचे हक्क कायम केले. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत सामाजिक ट्रस्टची स्थापना करून लोकांचे एक मंडळ नेमण्यात येऊन याचा प्रमुख म्हणून करमाळय़ाचे तहसीलदार काम करीत असतात. रावरंभाच्या रूपाने करमाळा गावाला एक ओळख झाली. तर कमळादेवी मंदिराच्या रूपाने नवीन बांधकामशैलीत भर पडली.

श्रीमंत रावरंभा रंभाजी निंबाळकर यांनी मंदिर निर्मितीच्या वेळी बसवलेल्या या जुन्या घंटा अजूनही मंदिर प्रशासनाने काळजीपूर्वक जपुन ठेवल्या आहेत.

मंदिराच्या अगदी समोरच एक शंकराचे अगदी छोटेसे पण सुंदर दगडी घुमटी सारखे देऊळ आहे आणि त्याच्या शेजारी कुणाची तरी समाधी. समाधीचा वापर सध्या गावकरी पत्त्यांचा फड लावण्यासाठी करतात.
शंकराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. फोटो ला जर झुम करून बघीतले तर एका नक्षी पट्टीवर 'शिव' हा शब्द कोरुन नक्षी बनवली आहे, व ' शिव' या शब्दाची जाडी, लांबी, उंची सारखीच आहे हे विशेष...
(फोटो झुम करून बघावा)..
(फोटो झुम करून बघावा)..

कमलादेवी मंदिर परिसरातील आणखी एक महत्त्वाची बाब, ती म्हणजे "सैराट' चित्रपटानंतर संपूर्ण राज्यात चर्चेला आलेली "हत्ती बारव' ९६ पायऱ्यांची विहीर ! मुख्य मंदिरासमोरील शेतामध्ये एक भव्य असा बारव असून चिरेबंदी दगडापासून बनविलेल्या बारवाची खोली सात पुरुष म्हणजे शंभर फूट आहे. या बारवेवर हत्तीची मोट चालायची असे सांगितले जाते. कातीव दगडात बांधलेल्या ह्या अष्टकोनी विहिरीत पाणी जवळपास ५० ते ६० फुट खोलवर असेल. पण पाण्यासाठी त्या खोलीपर्यंत बांधलेल्या एकसारख्या सुरेख ९६ पायऱ्या आहेत. तत्कालीन कालखंडात कुठलीही यंत्रसामुग्री उपलब्ध नसताना एवढी विहीर खोदताना किती कष्ट उपसावे लागले असतील याचा अंदाज करता येत नाही. मंदिर बांधकामासाठी जेवढा खर्च आला त्यापेक्षा एक पैसा जास्त खर्च या बारवावर झाल्याचे मौखिक इतिहासातून सांगितले जाते.
बारवाचा आकारमान मोठा असल्याने त्यावर चालणारी मोटसुद्धा हत्तीची होती. हत्तीचा वापर करून मोटेच्या साहाय्याने पाणी काढून ते शेजारच्या शेताला दिले जायचे. देवीच्या पूजेसाठी लागणारी बाग त्या ठिकाणी होती. आजही ‘हत्ती बारव’ हा पूर्णपणे सुस्थितीत असून पाणी काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटेचे अवशेष त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. बारवाच्याच बाजूला एक छोटीशी समाधी असून ती मोटेकरिता वापरण्यात येणाऱ्या हत्तीची असल्याचे सांगितले जाते.
पुरातन काळापासून पाणी पुरवठ्यासाठी बांधलेल्या अशा विहिरी (step wells) भारतभर पाहायला मिळतात. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे हि अगदी दक्षिण उत्तर अक्ष ठेऊन बांधली आहे. उत्तरेकडून पायर्या आणि दक्षिणेला विहीर. ह्या अक्षाचा फायदा म्हणजे सुर्यभ्रमण पूर्वेकडून पश्चिमेकडे होत असल्यामुळे, पाणी आणि पायऱ्या दिवसभर जास्तीजास्त वेळ सावलीत राहतात फक्त भरदुपारी १२ वाजण्याच्या आसपास पाण्यावर सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि सावलीतील पायऱ्या वापरणेही सोयीचे होऊन जाते. भारतभर जवळपास सगळ्याच अशा विहिरी (step Wells) ह्याच संकल्पनेवर बनलेल्या दिसतात हे विशेष. आपल्या पूर्वजांचे वातावरणाला अनुकूल करून घेणारे स्थापत्य बघून थक्क व्हायला होते. अर्थातच आपण जशी अनेक पुरातन पाणवठ्याची जशी वाट लावली आहे तशीच ह्या विहारीची देखील लावली आहे. पाणी उपसा नसल्यामुळे आणि कचरा टाकल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. जवळपास सगळीकडे गवत पसरले आहे आणि ह्या ऐतिहासिक ठेव्याशेजारीच ग्रामपंचायतीने महिलांसाठी असलेले पण बंद असणारे स्वच्छतागृह बांधले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तहसील मधील जिंती :-
प्रवास मार्ग -आपण पुणे जिल्ह्यातील दौंड नंतर सिध्दटेक भांबोरा राशिन मार्गाने जिंतीला जावू शकतो.तसेच करमाळा मार्गाने 16 किलोमीटरवर आहे करमाळा शहरातून राशिन सिध्दटेक मार्गाने रोशेवाडी वीट विहळ कोर्टी नंतर जिंतीला पोहचतो.हे गाव स्वराज संकल्पक शहाजीराजे भोसले महाराज राजमाता जिजाऊ याचे थोरले पुत्र संभाजीराजे महाराज आपल्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू त्यांचे वंशज म्हणजेच जिंतीकर राजेभोसले त्यांचा हा ऐतिहासिक भव्य दिव्य वाडा आणि मकाई देवी यांचे समाधी तिर्थ.
आपल्या सर्वांना छत्रपती भोसले घराण्यातील सातारा करवीर या शाखा आणि तंजावरच्या भोसले राजघराण्याबद्दल हि माहिती आहे. पण फारच कमी लोकांना थोरले संभाजी महाराज यांच्या जिंतीकर राजे भोसले राजघराण्याबद्दल माहिती असेल कदाचित !
मकाई राजेभोसले ह्या या राजघराण्यातील कर्तबगार राजस्त्री होत्या त्यांनी जिंतीचा जवळपास १७४० पर्यंत राजकारभार पाहिला.त्या संभाजी महाराज यांचे पुत्र उमाजीराजे यांच्या पत्नी होत्या.त्यांच्या आदर्श लोकहितवादी कारभारामुळे आजही जिंतीचे लोक त्यांना देवी मानतात त्यांची पूजा करतात दरवर्षी त्यांची यात्रा भरते
आजही येथील राजेभोसले परिवार रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजही रयतेला त्यांचाबद्दल आदर आहे ह्या राजे भोसले घराण्याच्या आजच्या वंशज आहेत सवितादेवी राजे भोसले (जिंतीकर) त्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.
अवश्य भेट द्या कधीतरी करमाळ्यास आल्यानंतर जवळच आहे ऐतिहासिक जिंती हे गाव थोरले संभाजीराजे महाराज यांच्या वंशजाच्या पदस्पर्शाने सहवासाने पावन आणि ऐतिहासिक वैभवाची पाऊलखुण्याची साक्ष देत आहे भव्य दिव्य ऐतिहासिक जिंतीकर राजे भोसले वाडा आजहीश्रीमंत शहाजीराजे महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे पुत्र थोरले संभाजीराजे महाराज भोसले यांचे वंशज ह्या वाड्यात राहत आहेत.
वेरूळच्या भोसले कुळाने महाराष्ट्रावर, भारतावर आणि हिंदूधर्मावर कधीही न फेडता येणारे उपकार केलेले आहेत. आपल्या पराक्रमाच्या शर्थीने ह्या घराण्यातील पराक्रमी कुलदिपकांनी हिंदुस्थानाची स्वतःची ओळख जीवंत ठेवलेली आहे. ‘शिवाजी महाराज झाले नसते तर, काशीला अवकळा आली असती, मथुरेची मशीद झाली असती, आणि सर्वांची सुंता झाली असती आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानाची सीमा तुमच्या-आमच्या घरांपर्यंत आली असती’ हे अनुक्रमे कविराज भूषण आणि स्व. यशवंतराव चव्हाणांचे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व सांगण्यास पुरेसे आहेत. याशिवाय ‘गोब्राह्मणप्रतिपालक मालोजी’, ‘हिंदुधर्मजिर्णोद्धारक शहाजी’ आणि ‘म्लेंच्छक्षयदीक्षित शिवाजी’ हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पूर्वजांना वापलेले विशेषणं त्यांचे कार्य, त्यांचे महत्व आणि त्यांनी केलेल्या उपकरांची जाणीव करून देतात.
पराक्रमी राष्ट्रपुरुषांच्या ह्या वंशात असा एक वीर आहे, ज्याच्या इतिहास त्याच्याविषयीच्या ज्ञात माहितीच्या अभावी असेल किंवा इतर कोणत्या कारणांमुळे असेल, महाराष्ट्रीय जनतेसमोर आला नाही किंवा जास्त प्रमाणात पोहचला नाही. हा वीर म्हणजे शहाजी राजांचा जेष्ठ पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जेष्ठ बंधु संभाजी होय.
या संभाजी राजांचा जन्म कधी झाला, याबद्दल मतांतरे आहेत. ठोस साधनांच्या अभावी त्यात एकवाक्यता नाही. जिजाबाई व शहाजीराजे ह्या दांपत्यास एकूण ६ पुत्र व १ कन्या झाली. पुत्रांपैकी फक्त संभाजी आणि शिवाजी हे दोघेच जगले, अशी माहिती शिवभारत ह्या समकालीन साधनात येते. संभाजी हे नाव शहाजीराजांचा चुलत भाऊ म्हणजेच विठोजीराजांच्या पुत्राचेही होते. निजामशाही दरबार संपल्यानंतर एकदा एक हत्ती बेभान झाला. त्याला आवरण्यात जाधव व भोसले या दोघी सरदारांमध्ये भांडण जुंपले. हि घटना खंडागळे हत्ती प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यात विठोजीपुत्र संभाजी मारला गेला. हे प्रकरण १६२३ साली घडले. हा विठोजीपुत्र संभाजी १९ फेब्रुवारी १६२३ पर्यंत जीवंत होता. २७ फेब्रुवारी १६२३ रोजी विठोजीच्या मुलांमध्ये वाटणी झाल्याचा कागद आहे. ह्या विठोजीस एकूण ८ पुत्र. त्यापैकी ६ मुलांमध्ये वाटणी झाल्याचा एक कागद आणि मालोजी नावाच्या एका मुलाचा दुसरा कागद उपलब्ध आहे. ह्यात संभाजीचा उल्लेख नाही. यावरून १९ फेब्रुवारी १६२३ ते २७ फेब्रुवारी १६२३ ह्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला असावा. तत्कालीन रूढीनुसार, आपल्या सख्ख्या चुलत भावाची स्मृति म्हणून शहाजीने आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले असण्याची शक्यता आहे. शिवादिग्विजय बखरीच्या आधारे रियासतकार सरदेसाई शहाजीपुत्र संभाजी राजांचा जन्म १६१९ चा मानतात. वा. सी.बेंद्रे संभाजी राजांचा जन्म १६२०-२१ सालीचा मानतात. पण विठोजीपुत्र संभाजी १६२३ पर्यंत जीवंत असून तो असतांना पुन्हा त्याचे नाव देणे, हे शक्य वाटत नाही. म्हणून वरील दोन्ही साल चुकीचे वाटतात. देवीसिंह चौहान यांनी संभाजीचा जन्म १६२३ चा मानलेला आहे. संभाजीचे १६२९ साली लग्न झाले. जर संभाजीचा जन्म १६२३ चा मानला तर लग्नासमयी त्याचे वय फक्त ६ वर्षांचे येते. त्याचे वय ६ वर्षांचे असल्यास त्याच्या वधूचे वय निदान ५ वर्षांचे मानावे लागेल. त्याकाळी लहान वयात लग्न व्हायची. पण शिवाजी राजांचे पहिले लग्न आणि त्याचा मुलगा राजारामाचे लग्न १० व्या वर्षी लग्न झाले. यांच्या वधू त्यावेळी ७ ते ९ वर्षांच्या असाव्या. म्हणून शहाजीपुत्र संभाजी राजांचे वयाच्या ६ व्या वर्षी लग्न योग्य वाटत नाही. संभाजीच्या जन्मकालाची निश्चिती साधनांच्या अभावी करता येत नाही.
१६२४ साली निजामशाही आणि आदिलशाही यांच्यात भातवडी येथे लढाई होऊन त्यात शहाजीने पराक्रम दाखवला आणि शरीफजी मृत्यूमुखी पडले. यावेळी उभयता बंधु निजामशहाकडून लढले. १९ डिसेंबर १६२५ रोजीच्या महजरात ‘साहाजी भोसला येदीलशाही’ असा उल्लेख येतो. त्यावरून डिसेंबर १६२५च्या पूर्वी शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीत गेला. शहाजी आदिलशाहीत जुलै १६२५ च्या आधी गेला असावा. आदिलशहाने त्यास ‘सरलष्कर’ हा खिताब दिला. त्याने स्वतःस सरलष्कर म्हटल्याचा जुना उल्लेख जुलै १६२५ चा येतो. त्यावरून तो आदिलशाहीत जुलै १६२५ च्या सुमारास गेला असावा. शहाजी आदिलशाहीत सुमारे १६२८ पर्यंत होता. कारण शके १५४९ च्या फाल्गुन शु.१५ (८-३-१६२८) रोजी त्याने स्वतःस सरलष्कर म्हटलेले आहे. त्यानंतरच्या शके १६५०च्या श्रावणातील कागदावर (२५-७-१६२८) त्यास सरलष्कर हा किताब नाही. त्यानंतर शहाजी निजामशाहीत आला.
‘नंतर काही दिवसांनी तो (संभाजीच्या लग्नाचा) समारंभ आटोपल्यावर व्याह्याच्या संमतीने आपल्या गरोदर पत्नीस स्वजनांसह त्याच किल्ल्यावर ठेवून शहाजी राजा दर्याखानास जिंकण्यास निघाला’, असा उल्लेख शिवभारतात येतो. दर्याखानाची स्वारी १६२८ ची आहे. त्याच वेळी जिजाबाई गरोदर होती. त्यामुळे संभाजी राजांच्या लग्नाचे वर्ष १६२९-३० चे असावे. संभाजीचे लग्न विश्वासराजाच्या कुळांतील सिद्धपालाचा मुलगा विजयराज याच्या कन्येशी- जयंतीबाईशी- झाले. हा विजयराज निजामशाही सरदार असून तो शिवनेरी किल्ल्यावर राहत असे. शहाजीचा कनिष्ठ बंधु शरीफजीचा विवाह विश्वासराजाच्या मुलीशी झाला होता, ती मुलगी ह्याच कुळातील असावी. तोच ऋणानुबंध लक्षात घेऊन शहाजीने आपल्या मुलाचे लग्न जयंतीबाईशी केले असावे आणि त्याच ऋणानुबंधामुळे अत्यंत विश्वासाने जिजाबाईस आणि इतरांस शिवनेरीवर ठेवले असावे.
पुढे २५ जुलै १६२९ साली लखुजीराव जाधव आणि त्याच्या ३ मुलांचा निजामशाही दरबारात खून झाला. त्यामुळे इतर जाधव मंडळींनी निजामशाही सोडून मोगलांची नोकरी पत्करली. शहाजी राजांनीही तोच मार्ग अनुसरत नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखानामार्फत मुघलांची नोकरी पत्करली. त्यांना व त्यांच्या भावांस बादशहाने मनसबी दिल्या. त्यात शहाजी राजास ५ हजार जात/ ५ हजार स्वार आणि त्याचा पुत्र संभाजी राजांंना २ हजार स्वार/ २ हजार जात अश्या मनसबी मिळाल्या. शहाजी राजांना एक मानाचा पोशाख, एक हत्ती, घोडा, खंजीर, झेंडा, नगारा व दोन लाख रुपये तर संभाजी राजास एक मानाचा पोशाख व घोडा अश्या भेटी आजमखानाने दिल्या. पुढे बादशहाने शहाजी राजांची जहागीर फत्तेखानास दिली. याची त्याला चीड येऊन त्यांनी मोगलांविरुद्ध बंड पुकारलं. ह्या बंडास आदिलशहाचाही पाठिंबा असावा. म्हणून २३ जुलै १६३२ रोजीचं मुहम्मद आदिलशहाने गदगच्या देसायांना पाठवलेले एक फर्मान आहे. त्यात मीर अली रजा याच्याकडे असलेला गदग परगण्यातील सर्व गावाचा मोकासा संभाजी राजांच्या नावे केलेला आहे. कदाचित हि शहाजी राजांना आर्थिक मदत असावी. मुघलांनी पुढे दौलताबादचा किल्ला जिंकल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर १६३३ मध्ये १० वर्षाच्या मूर्तजा नावाच्या निजामशहाच्या वंशास पेमगिरी किल्ल्यावर गादीवर बसविले.
पुढे शहाजी राजांनी शिवाजीराजे, जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांसह पुण्यास पाठविले. त्यावेळी दादोजीने पुण्यात शिवाजीराजांसाठी लाल महाल बांधला. त्याच प्रमाणे संभाजीसाठीही एक वाडा बांधला. वेदमूर्ति खंडभट शालिग्राम यांच्या वाड्यापर्यंत उत्तराभिमुख जोते असलेला हा वाडा होता.
शहाजीच्या एवढ्या हालचालीत आणि धामधुमीच्या राजकारणात संभाजी राजांच्या सक्रिय सहभागाचे उल्लेख आढळत नाही. शहाजी राजे मुघलांकडे गेले, त्यावेळी संभाजी राजांनाही मनसब मिळते, याचा उल्लेख वर आलेला आहे. याव्यतिरिक्त संभाजी राजांच्या नावाचा उल्लेख या शहाजी राजांच्या हालचालींमध्ये फारसा आढळत नाही. याचा एक अर्थ असा असावा की यावेळीपर्यंत संभाजी राजाचे वय राजकारणात किंवा लढायांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे नसावे. पण साधनांच्या अभावामुळे कोणताही तर्क किंवा कोणताही निर्णय करता येत नाही.
शहाजहान बादशहा १६३६च्या आरंभी दक्षिणेत आला. त्याने शायिस्ताखानास शहाजी राजांचा मुलुख घेण्याचा आदेश दिला. फेब्रुवारी-मे १६३६ मध्ये आठ हजार स्वारांच्या फौजेसह नाशिक, त्रिंबक, संगमनेर हा प्रदेश काबीज करण्यासाठी शायिस्ताखान निघाला होता. अहमदखानाने शाहजी राजांच्या लोकांकडून रामसेजचा किल्ला घेतला. पुढे ८ मार्च १६३६ रोजी शायिस्ताखान संगमनेरास पोहचला. त्याने त्या बाजूचे परगणे संभाजीकडून हस्तगत करण्यास सुरवात केली. शत्रू नासिककडे गेल्याचे समजताच त्याने आपली माणसे त्या भागात पाठवली. खान-इ-खानान यास जुन्नरकडे पाठविले. अहमदनगरचा मुलुख सैनिकांवाचून मोकळा आहे तेव्हा शायिस्ताखानास तिकडे जाण्याचा हुकूम मिळाला. तो निघताच त्यास बाकिरच्या लिहिण्यावरून कळून आले, कि बाकिर शाहजी राजांच्या मुलाच्या पाठलागावर कोकणच्या बाजूस गेला आहे व जुन्नरास फार थोडे लोक शिल्लक असल्याने ५०० लोक सय्यद अली अकबरच्या हाताखाली पाठविले. बंडखोर माहुलीकडे गेल्याचे समजताच बाकिर तिकडे गेला. यावेळी संभाजी चांभारगोंद्याकडे होता म्हणून बाकिर तिकडे गेला. तिकडून बाकीर जेथे शहाजी राजांची मुलेमाणसे होती तेथे - जुन्नरकडे आला. येथे उभयपक्षाची लढाई सुरू झाली.
शायिस्ताखानास हि बातमी समजताच त्याने ७०० लोकांची कुमक जुन्नरकडे पाठवली. कुमक जुन्नरात पोहचू नये, म्हणून विरुद्ध पक्षाने प्रयत्न केले. तरी कुमक जुन्नरास पोहचली. पण या लोकांस रसदेची कमतरता जाणवल्याने त्यांनी शायिस्ताखानाकडे मदत मागितली. खान आपल्या थोड्याच सैनिकांसह शहरात आला आणि शत्रूस परगंदा केले. भिवरेच्या तिरापर्यंत पाठलाग करून कित्येकास कापून खान माघारी फिरला. जुन्नरचा किल्ला जिंकणे शक्य वाटत नसल्याने त्याने बाकिरास बोलावून शहराच्या रक्षणास ठेवले व स्वतःने जुन्नर व संगमनेर हे परगणे जिंकले. पुढे निजामशाही प्रदेश जिंकून शहाजहानने शहाजी राजांना पराभूत केले आणि याचबरोबर निजामशाहीचा अंत झाला.
निजामशाहीचा अंत झाल्यावर शाहजी राजे आदिलशाहीत आले आणि रणदौलाखानाच्या नेतृत्वात त्यांनी दक्षिणेत ३ वेळा स्वारी केली. १६३७ मध्ये पहिली स्वारी करून ह्या उभयतांनी इक्केरीच्या विरभद्र नायकाचा पराभव केला. दुसऱ्या स्वारीत रणदौलाखानाबरोबर अफजलखान आणि शाहजी राजे होते. अफजलखानाची रवानगी शिऱ्यास झाली तर शाहजी राजे बंगलोरवर चालून गेले. अफजलखनाने शिऱ्याच्या कस्तूरीरंग नायकास दग्याने मारून त्याचा पराभव केला आणि शाहजी राजांनी केपगोंडा नावाच्या अंमलदारास पराभूत करून बंगरुळ हस्तगत केले. नंतर रणदौलाखान स्वतः तेथे गेला आणि बंगरुळावर शहाजी राजांची नेमणूक केली. यावेळी बंगरुळास इसलामपुर नाव देण्यात आले. १६३९-४० मध्ये तिसरी स्वारी झाली त्यात बसवापट्टण, चिक्कनायकहळ्ळी, बेलूर, टुमकुर इ. स्थळे काबीज केली.
शहाजी राजांनी बंगरुळ जिंकल्यानंतर ते बंगरुळासच राहत असत. बंगरुळास त्यांची राहणी अत्यंत विलासी होती. त्यांची दिनचर्या एखाद्या राजाला शोभेल अशी होती. त्यांनी आपल्या पदरी अनेक कवी बाळगलेले होते. जयराम पिंड्ये कृत राधामाधवविलासचंपूत त्याचे अत्यंत रसाळ वर्णन कवीने केलेले आहे. शहाजी राजांच्या ह्या राजेशाही थाटास शोभेल अशी एक गोष्ट म्हणजे, त्यांनी आपल्या पुत्राचा यौवराज्याभिषेक केलेला असावा. संभाजीस युवराज पद असावे. याव्यतिरिक्त आदिलशहाने शहाजी राजास पाठवलेल्या अनेक फर्मानांमध्ये त्यास ‘फर्जंद’ म्हटलेले आहे. ‘फर्जंद’ हि उपाधी बादशहाच्या उच्च सरदारांस बादशहा लावत असे. फर्जंद’ म्हणून शाहजी राजांचा आदिलशहाने केलेला जुन्यात जुना उल्लेख हा ३० जानेवारी १६४२ चे असून, त्यास ‘फर्जंद’ हा किताब त्या आधी मिळाला असावा.
सन १६४३-१६४४ मध्ये रणदौलाखानाचा मृत्यू झाला. रणदौलाखान हा शाहजी राजांचा मित्र होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागेवर मुस्तफाखान खानबाबा याची नेमणूक केली. इकडे शाहजी राजांचे वाढते महत्व, हिंदु नायकांस त्यांचा वाढता पाठिंबा बघता दरबारातील काही लोकांस ते अडचणीचा वाटू लागले. मुस्तफाखान हा कडवा मुसलमान होता. कर्नाटकातील नायक शाहजी राजांच्या आज्ञेत वागू लागले. म्हणून मुस्तफाखानाने शाहजी राजांचा विश्वास संपादन केला आणि एके रात्री आपल्या सरदारांस बोलावून शाहजी राजांच्या अटकेची योजना आखली. पहाटे मुस्तफाखानाचे लोक शाहजी राजांवर चालून गेले. बेसावध असलेल्या शाहजी राजांच्या तुकडीने प्रतिकाराचा प्रयत्न केला. त्या लढाईत शहाजी राजे बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडले. त्या अवस्थेत मुस्तफाखानाने शहाजी राजांना कैद केले. शहाजी राजास कैद केल्याची बातमी संभाजी राजांना कळताच त्यांना मुस्तफाखानाचा अत्यंत संताप आला. त्यावेळी ते बंगरुळास होते. शिवाजी राजांनीही हि बातमी ऐकून आदिलशहाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. ‘बंगरुळी राहणारा माझा भाऊ तेथे युद्ध करेल आणि मी ह्या गडांचे रक्षण करीत शत्रूशी ससैन्य लढेल’ असे वाक्य शिवाजीराजांच्या तोंडी शिवभारत ह्या समकालीन ग्रंथात आहेत.
शहाजी राजास कैद करून त्यास बादशहाकडे नेण्यात आले. बादशहाने शहाजी राजांचा प्रदेशाचा ताबा घेण्यासाठी फत्तेखानास शिवाजीराजांविरुद्ध पाठवले तर बंगरुळ घेण्यासाठी मुस्तफाखानाने तानाजी डूरे, विठ्ठल गोपाळ आणि फरादखान यांची संभाजी राजांवर रवानगी केली. ह्या सर्वांचा संभाजी व शिवाजी राजांनी पराभव केला. फरादखानाचा मोड केल्याबद्दल शिवभारतकार आदिलशहाच्या तोंडी अत्यंत मार्मिक वाक्य टाकतो. फरादखानाचा पराभव केल्यानंतर आदिलशहा विचार करतो, “आपल्या पित्यासाठी संभाजी राजाने तिकडे फरादखानाचा पराभव केला आणि इकडे शिवाजी राजाने युद्धामध्ये फतेखानासही पळवून लावले. त्या विजयी संभाजीने तिकडे फरादखानाचा मोड केला नाही तर माझेच मन आज ह्याने भग्न केले आहे. केवढे मोठे त्याचे सामर्थ्य हे!” आदिलशहाच्या शिवाजीराजांवरील फत्तेखानाच्या स्वारीची बरीच माहिती मिळते पण, संभाजी राजांवरील फरादखानाच्या स्वारीचा शिवभारत सोडून इतरत्र कुठेही उल्लेख नाही. फत्तेखानास पराभूत करून शिवाजीराजांनी शहाजहानचा मुलगा मुरादबक्ष याच्याशी पत्रव्यवहार केला. त्या पत्रात त्याने शहाजी राजाने मुघलांविरुद्ध केलेल्या बंडाच्या गुन्ह्याची माफी मागून जुन्नर व अहमदनगर येथील देशमुखीची मागणी केलेली आहे. ह्या शिवाजी-मुरादबक्ष यांच्या संपर्काचा सुगावा आदिलशहास लागला असावा. त्यामुळे त्याच्यावर दडपण आले असावे. याशिवाय संभाजी आणि शिवाजी राजे यांनी अनुक्रमे फरादखान आणि फत्तेखानाचा पराभव केल्याने आदिलशहाने शाहजीच्या सुटकेचा निर्णय घेतला. शिवाजीने सिंहगड आणि संभाजीने बंगरुळ देऊन शाहजी राजांची सुटका करून घ्यावी, अशी अट बादशहाने घातली. त्यानुसार देऊन १६ मे १६४९ रोजी शहाजी राजांची सुटका झाली.
यापुढील संभाजी राजांच्या आयुष्याविषयी निश्चित माहिती मिळत नाही. संभाजी राजांचा मृत्यू नक्की कधी झाला, याबद्दल मतांतरे आहेत. ९१ कलमी बखर, चिटणीस बखर, शिवादिग्विजय बखर, शेडगावकर भोसले बखर ह्या बखरी संभाजीराजे कनकगिरीच्या लढाईत तोफेचा गोळा लागून मारले गेल्याचे सांगतात. अज्ञानदासाच्या पोवाड्यात अफजलखानाने दगा केल्याचे उल्लेख आहेत. २५ फेब्रुवारी १६५४ रोजी संभाजी राजास उमाजी नावाचा पुत्र झाल्याचा उल्लेख जेधे शकावलीत आहे. याचा अर्थ संभाजी राजे फेब्रुवारी १६५४ पर्यंत जीवंत असावेत. ४ एप्रिल १६५४ रोजीचे संभाजी राजे नावाचे एक इनाम पत्र उपलब्ध आहे. जर ते शहाजी पुत्र संभाजी असेल तर, संभाजी राजांची आयुमर्यादा ४ एप्रिल १६५४ पर्यंत वाढवता येते. याशिवाय १४ मे १६५७ रोजी शिवाजीराजांना पुत्र होऊन त्याने त्याचे नाव संभाजी ठेवले. आपला सख्खा मोठा भाऊ जीवंत असतांना त्याचे नाव आपल्या मुलास ठेवण्याची प्रथा त्याकाळी नव्हती. त्यामुळे शहाजी पुत्र संभाजी राजांचा मृत्यू संभाजीचे बारसे होण्यापूर्वी मे-जून १६५७ पूर्वी झाला असावा. कनकगिरीच्या ज्या मोहिमेत संभाजी राजांचा मृत्यू झाल्याचे काही साधने सांगतात, ती कनकगिरीची मोहीम जानेवारी १६५५ पूर्वी झाली असली पाहिजे. कारण १६ जानेवारी १६५५ रोजीचे आणि २१ जानेवारी १६५५ च्या पत्रात पुणे परगण्यात कनकगिरीपट्टी नावाचा कर बसविल्याचा उल्लेख आहे. मोहिमेचा खर्च भागवण्यासाठी अश्या प्रकारचा कर पूर्वी बसवत असत. संभाजी राजांचा मृत्यू कनकगिरीच्याा वेढ्यात झाला, असे गृहीत धरल्यास त्याचा मृत्यू जानेवारी १६५५ पूर्वी झाला असला पाहिजे. सिद्धी जौहरचा वेढा सुरू असतांना नेतोजी पालकर हा कर्नाटकात होता. तो राजगडास आल्यानंतर जिजाबाईने त्याची निर्भत्सना केली व माझ्या ‘एकुलत्या एक पुत्रास’ मी स्वतः सोडवून आणीन, असे जिजाबाई नेतोजीस म्हणाली, हि माहिती शिवभारतात येते. सिद्दी जौहरचा पन्हाळ्यास १६६० साली वेढा होता. याचा अर्थ संभाजी राजांचा १६६० पूर्वी मृत्यू झाला असला पाहिजे.

वा.सी.बेंद्रे यांनी आपल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वडीलबंधु संभाजीराजे भोसले’ या पुस्तकात संभाजी राजांचा मृत्यू १६६३ पर्यंत ओढलेला आहे. त्यासाठी त्यांनी शिलालेखांचा आधार दिलेला आहे. या शिलालेखात संभाजी राजास ‘श्रीमद राजाधिराज महाराज’ यांसारखे विशेषणं वापरलेले आहेत. शहाजी राजे जीवंत असतांना असे राजा असल्यासारखे विशेषण संभाजी राजे स्वतःस लावणार नाही असे वाटते. यावरून हा तोच संभाजी असावा का याबद्दल शंका येते. हि शंका आणखी बुचकळ्यात टाकणारा एक उल्लेख सापडतो. हा उल्लेख म्हणजे जयिताबाई नावाच्या स्त्रीने भाऊजीपंत यास जमीन इनाम दिल्याचा शिलालेख आहे. ह्या जयिताबाईचा उल्लेख शिलालेखात ‘संभाजी राजाची पत्नी’ असा करण्यात आलेला आहे. संभाजीच्या पत्नीचे नाव जयंतीबाई होते, असे शिवभारतात आलेले आहे. त्यामुळे इतर शिलालेखात उल्लेखित संभाजी शहाजीपुत्र असावा का, असा संशय वाटतो. ह्या शिलालेखात उल्लेखित संभाजीराजाचा शेवटचा उल्लेख १६६३ च्या दानाच्या शिलालेखात आढळतो. जसा १६६३ चा संभाजी राजांचा शेवटचा उल्लेख आढळतो, त्याच्याच विरुद्ध एक उल्लेख १६६२ च्या एका शिलालेखात आढळतो. हा शिलालेख एकोजी राजाचा असून त्यात ‘ during the government of Enkoja-Raja: — the havaldar of Rahadurga, Baranaji-Raja, granted a nettara-kodige for Simangala Chikka-Deva's son Tiramapa.’ असा उल्लेख येतो. जर संभाजी १६६३ पर्यंत हयात होता तर १६६२ सालच्या शिलालेखात ‘एकोजीराजाच्या काळात’ असा उल्लेख का येतो?
जसे संभाजी राजांचे हे शिलालेख सापडलेले आहेत, त्याचप्रमाणे जयिताबाईचेही (जयंतीबाई ?) शिलालेख सापडलेले आहेत. तिचे १६९३ पर्यंतचे शिलालेख सापडलेले असून काही शिलालेखात तिला शिवाजीचा मुलगा संभाजीची बायको म्हटलेले आहे. पण ते चूक असून ती शहाजीपुत्र संभाजीची बायको असावी.
संभाजी राजांना उमाजी नावाचा एक मुलगा होता. त्याचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ रोजी झाला. संभाजीस सुरतसिंह नावाचा मुलगा असल्याचे रियासतकार गो. स. सरदेसाई सांगतात. पण त्याला पुरावा त्यांनी दिलेला नाही. कर्नाटकात सापडलेल्या शिलालेखांमध्ये संभाजीस मालुकोजी किंवा माणकोजी नावाचा एक मुलगा असल्याचा उल्लेख येतो.
संभाजी आणि शिवाजीराजांचा फारसा संबंध येत नाही किंवा तसे सांगणारे कागदपत्र उपलब्ध नाहीत. शिवाजीराजांनी संभाजीस एक गाव दिल्याचा उल्लेख सापडतो. इंदापूर परगण्यातील मौजे बोरी हे गाव ३०-१०-१६४६ रोजी शिवाजीराजांनी संभाजीस दिले. इंदापुरचा मोकासा शिवाजीस अर्जानी झाला म्हणून मोकदमीचे हक्क कायम केल्याची दोन पत्रे ३०-१०-१६४६ ची आहेत. संभाजीचा मुलगा उमाजी यास बहादूरजी नावाचा मुलगा होता. उमाजी पुढे आपल्या बायकोसह – मकुबाई- आपल्या मुळ जहागिरीकडे महाराष्ट्रात आला असावा. त्याने जिंतीची आपली देशमुखी घेण्याची खटपट केली. महादजी व बाजी देवकर यांना देशमुखीवरून हाकलून ती हडपण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्या उद्योगात काही यश येण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला असावा. पुढे १६८९ मध्ये औरंगजेब बादशहाकडून त्याच्या शिक्क्यानिशी पत्र आणवून बहादूरजीने आपली वडीलोपार्जित जहागीर ताब्यात घेतली. उमाजी आपल्या जुन्या वतनी गावी आला तरी, जयंतीबाई मात्र आपल्या इतर मुलाबरोबर कर्नाटकातच होती. १६९३ पर्यंतचे तिचे दानाचे शिलालेख आढळले आहेत. पुढे मकुबाई म्हणजे उमाजीची बायको हिचे शाहूशी सख्य असल्याचे दिसून येते. १७०३ सालचा मकुबाई भोसलेचा मोकदम म्हणून उल्लेख एका महजरात येतो. कदाचित १७०३ सालच्या आधी बहादूरजीचाही मृत्यू झाला असावा. त्यामुळे देशमुखीचा कारभार मकुबाई पाहत असावी. तीचा देशमुखीचा शिक्काही उपलब्ध आहे. शाहू किंवा बाळाजी पेशवा तीचा उल्लेख ‘मातुश्री’ म्हणून करत असत. १७२३ साली छत्रपती घराण्यात कोणाचे तरी लग्न असावे. त्या लग्नासाठी शाहूने मकुबाईस बोलावले होते व वाटखर्चाबद्दल ४६ रुपये दिले. हि शेवटपर्यंत जिंतीसच राहत असावी.जिंतीस तिची समाधी आहे. यानंतर मात्र ह्या वंश्याविषयी फारशी माहिती मिळत नाही.

संभाजी राजांच्या जन्मासालाबद्दल आणि लग्नासालाबद्दल साधनांच्या अभावी वर जो थोडा गोंधळ झालेला आहे, त्यावर अधिक विचार केल तर विठोजीपुत्र संभाजी हा १९ फेब्रुवारी १६२३ ते २७ फेब्रुवारी १६२३ ह्या कालावधीत खंडागळे हत्ती प्रकरणात मृत्युमुखी पडला, हे वर सांगितलेले आहे. याचा अर्थ शहाजीपुत्र संभाजी राजांचा जन्म फेब्रुवारी १६२३ नंतरचा आहे. पण १६२३ सालचा संभाजी राजांचा जन्म जर मानला तर शिवभारतकाराने दिलेल्या संकेतानुसार १६२९ साली ह्या संभाजी राजांचे लग्न झाले.पण ह्यावेळी त्यांचे वय केव्ळ ४-५ वर्षांचे येते. त्या काळात बालविवाहास संमती असली तरी इतक्या लहान वयात लग्न होईल, असे वाटत नाही. त्यामुळे हा घोळ कसा सोडवावा, याबद्दल येथे विचार करू. हा घोळ सोडविण्याचा एक मार्ग आहे. बुसातीन-उस-सलातीन ह्या फारसी ग्रंथात संभाजी राजांच्या लग्नाचा उल्लेख आहे. त्याआधी दिलेल्या घटनांचा विचार करता ह्या फारसी ग्रंथावरून संभाजी राजांच्या लग्नाचे वर्ष १६३३ येते. १६३३ हे साल जर संभाजी राजांच्या लग्नाचे मानले आणि १६२३ साल जन्माचे मानले, तर लग्नाच्या वेळी संभाजी राजे १० वर्षांचा असले पाहिजे. शिवाजी महाराजांचे पहिले लग्न १० वर्षांचे असतांना झाले होते. त्यामुळे संभाजीच्या वयाचा आणि त्याच्या पूर्वायुष्यातील विवाहादि घटनांचा बरोबर मेळ बसतो. पण बुसातीन-उस-सलातीन मध्ये दिलेल्या घटनांचा इतर साधनांशी पडताळून पाहिल्यास क्रम चुकीचा वाटतो. त्यामुळे गुरुवर्य ग. भा. मेहेंदळे यांनी १६३३ हे साल चुकीचे मानले आहे. संभाजीच्या जन्माबद्दल आणि लग्नाबद्दल अधिक खुलासा साधनांच्या अभावी करता येत नाही. जर १६३३ साल त्याच्या लग्नाचे मानले तर हा घोळ सुटतो, पण विश्वसनीयतेचा प्रश्न उभा राहतो. असो.
संभाजीचे एकंदरीत आयुष्य पाहता, ते अत्यंत पराक्रमी दिसतात. शहाजीराजांची रसिकता त्याच्याही अंगी असली पाहिजे. मराठी, संस्कृत, फारसी इ. भाषा त्यांना अवगत असाव्या. पण त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत एक-दोन घटना सोडल्या, तर इतर कोणतीही घटना निश्चित होत नाही. संभाजी राजांचे वंशज सध्या जिंती ता.करमाळा जि. सोलापुर येथे वास्तव्यास आहेत. शहाजीराजे भोसले, त्यांच्या पत्नी सवितादेवी भोसले व युवराज शिवाजी राजेभोसले हे आपल्या पिढीजात वाड्यात वास्तव्यास आहेत.
शहाजी राजांच्या चरित्रात संभाजी राजांचे जेवढे उल्लेख येतात, त्यावरून त्याच्या चरित्राचा सांगाडा बांधावा लागतो. कदाचित त्यामुळेच वा.सी.बेंद्रे यांनी लिहिलेले चरित्र सोडले, तर इतर त्याचे स्वतंत्र चरित्र नाही. त्यामुळे संभाजी राजांचे एक स्वतंत्र चरित्र लिहून बेंद्रेंनी एक महत्वाचं काम ५७ वर्षांपूर्वी केलेले आहे. संभाजी आणि त्याच्या वंशजांबद्दल संशोधनास वाव आहे. त्याबद्दल तंजावरच्या ग्रंथालयात शोध घेतला पाहिजे. शिवाजी-संभाजी-राजाराम ह्या भोसल्यांच्या शाखेने स्वतःच वेगळं राज्य उभारलं, त्यामुळे त्यांस एक वेगळं महत्व प्राप्त झालं. कर्नाटकात व्यंकोजीची शाखाही प्रसिद्ध आहे. पण ह्या संभाजीच्या जिंती शाखेबद्दल जनमानसात तितका प्रचार आणि प्रसिद्धी नाही. ह्या शाखेची प्रसिद्धी कदाचित साधनांच्या अभावी असलेल्या माहितीच्या अभवामुळे खुंटली असावी.

करमाळ्याला जावे कसे ?
रेल्वेने - जवळचे रेल्वे स्थानक जेऊर,मध्य रेल्वेच्या पुणे-सोलापूर मार्गावर आहे.जेऊर पासून करमाळा ११ किमी अंतरावर आहे.
रस्ते मार्गे- सोलापूर पासूनचे अंतर १३५ किमी पुण्यापासून २०० किमी अंतरावर आहे आणि अहमदनगर पासून ९० किमी अंतरावर असून स्वतःच्या वाहनाने आणि बस ने जाऊ शकता.

संदर्भ :-
१) सोलापुर जिल्हा गॅझेटीयर
२) स्थलकाल - अरुण टिकेकए
३) https://marathi.webdunia.com, https://vishwakosh.marathi.gov.in, https://www.discovermh.com/karmala-fort, https://www.loksatta.com या वेबसाईट
४) www.durgbharari.in हि वेबसाईट
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) प्रा. डॉ. सतीश कदम, शिवभक्त शुभम गायकवाड यांचे लिखाण

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तहसील मधील जिंती
प्रवास मार्ग -आपण पुणे जिल्ह्यातील दौंड नंतर सिध्दटेक भांबोरा राशिन मार्गाने जिंतीला जावू शकतो.तसेच
करमाळा मार्गाने 16 किलोमीटरवर आहे करमाळा शहरातून राशिन सिध्दटेक मार्गाने रोशेवाडी वीट विहळ कोर्टी नंतर जिंतीला पोहचतो.

हे गाव स्वराज संकल्पक शहाजीराजे भोसले महाराज राजमाता जिजाऊ याचे थोरले पुत्र संभाजीराजे महाराज आपल्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू त्यांचे वंशज म्हणजेच जिंतीकर राजेभोसले 
त्यांचा हा ऐतिहासिक भव्य दिव्य वाडा आणि मकाई देवी यांचे समाधी तिर्थ.
आपल्या सर्वांना छत्रपती भोसले घराण्यातील सातारा करवीर या शाखा आणि तंजावरच्या भोसले राजघराण्याबद्दल हि माहिती आहे. पण फारच कमी लोकांना थोरले संभाजी महाराज यांच्या जिंतीकर राजे भोसले राजघराण्याबद्दल माहिती असेल कदाचित

मकाई राजेभोसले ह्या या राजघराण्यातील कर्तबगार राजस्त्री होत्या त्यांनी जिंतीचा जवळपास1740 पर्यंत राजकारभार पाहिला.त्या संभाजी महाराज यांचे पुत्र उमाजीराजे यांच्या पत्नी होत्या.त्यांच्या आदर्श लोकहितवादी कारभारामुळे आजही जिंतीचे लोक त्यांना देवी मानतात त्यांची पूजा करतात दरवर्षी त्यांची यात्रा भरते
आजही येथील राजेभोसले परिवार रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजही रयतेला त्यांचाबद्दल आदर आहे ह्या राजे भोसले घराण्याच्या आजच्या वंशज आहेत सवितादेवी राजे भोसले (जिंतीकर) 
त्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.
अवश्य भेट द्या कधीतरी करमाळ्यास आल्यानंतर जवळच आहे ऐतिहासिक जिंती हे गाव थोरले संभाजीराजे महाराज यांच्या वंशजाच्या पदस्पर्शाने सहवासाने पावन आणि ऐतिहासिक वैभवाची पाऊलखुण्याची साक्ष देत आहे भव्य दिव्य ऐतिहासिक जिंतीकर राजे भोसले वाडा आजहीश्रीमंत शहाजीराजे महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचे पुत्र थोरले संभाजीराजे महाराज भोसले यांचे वंशज ह्या वाड्यात राहत आहेत.
देवी मकाईदेवीं च्या चरणी सदैव नतमस्तक हा मावळा 
जय शिवराय 

लेखन शिवभक्त शुभम गायकवाड पा. (लेख अधिकृत)©9696kuli©
वेरूळच्या भोसले कुळाने महाराष्ट्रावर, भारतावर आणि हिंदूधर्मावर कधीही न फेडता येणारे उपकार केलेले आहेत. आपल्या पराक्रमाच्या शर्थीने ह्या घराण्यातील पराक्रमी कुलदिपकांनी हिंदुस्थानाची स्वतःची ओळख जीवंत ठेवलेली आहे. ‘शिवाजी महाराज झाले नसते तर, काशीला अवकळा आली असती, मथुरेची मशीद झाली असती, आणि सर्वांची सुंता झाली असती आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानाची सीमा तुमच्या-आमच्या घरांपर्यंत आली असती’ हे अनुक्रमे कविराज भूषण आणि स्व. यशवंतराव चव्हाणांचे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्व सांगण्यास पुरेसे आहेत. याशिवाय ‘गोब्राह्मणप्रतिपालक मालोजी’, ‘हैंदवधर्मजिर्णोद्धारक शहाजी’ आणि ‘म्लेंच्छक्षयदीक्षित शिवाजी’ हे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पूर्वजांना वापलेले विशेषणं त्यांचे कार्य, त्यांचे महत्व आणि त्यांनी केलेल्या उपकरांची जाणीव करून देतात.
पराक्रमी राष्ट्रपुरुषांच्या ह्या वंशात असा एक वीर आहे, ज्याच्या इतिहास त्याच्याविषयीच्या ज्ञात माहितीच्या अभावी असेल किंवा इतर कोणत्या कारणांमुळे असेल, महाराष्ट्रीय जनतेसमोर आला नाही किंवा जास्त प्रमाणात पोहचला नाही. त्याच वीराच्या पराक्रमाच्या इतिहासाचा मागोवा ह्या लेखात घेण्याचे योजिले आहे. हा वीर म्हणजे शहाजीचा जेष्ठ पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जेष्ठ बंधु संभाजी होय.
ह्या संभाजीचा जन्म कधी झाला, याबद्दल मतांतरे आहेत. ठोस साधनांच्या अभावी त्यात एकवाक्यता नाही. जिजाबाई व शहाजीराजे ह्या दांपत्यास एकूण ६ पुत्र व १ कन्या झाली. पुत्रांपैकी शंभु म्हणजेच आपल्या लेखाचा नायक संभाजी आणि शिवाजी हे दोघेच जगले, अशी माहिती शिवभारत ह्या समकालीन साधनात येते. संभाजी हे नाव शहाजीराजांचा चुलत भाऊ म्हणजेच विठोजीराजांच्या पुत्राचेही होते. निजामशाही दरबार संपल्यानंतर एकदा एक हत्ती बेभान झाला. त्याला आवरण्यात जाधव व भोसले या दोघी सरदारांमध्ये भांडण जुंपले. हि घटना खंडागळे हत्ती प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे. ह्यात विठोजीपुत्र संभाजी मारला गेला. हे प्रकरण १६२३ साली घडले. हा विठोजीपुत्र संभाजी १९ फेब्रुवारी १६२३ पर्यंत जीवंत होता. २७ फेब्रुवारी १६२३ रोजी विठोजीच्या मुलांमध्ये वाटणी झाल्याचा कागद आहे. ह्या विठोजीस एकूण ८ पुत्र. त्यापैकी ६ मुलांमध्ये वाटणी झाल्याचा एक कागद आणि मालोजी नावाच्या एका मुलाचा दुसरा कागद उपलब्ध आहे. ह्यात संभाजीचा उल्लेख नाही. यावरून १९ फेब्रुवारी १६२३ ते २७ फेब्रुवारी १६२३ ह्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला असावा. तत्कालीन रूढीनुसार, आपल्या सख्ख्या चुलत भावाची स्मृति म्हणून शहाजीने आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले असण्याची शक्यता आहे. शिवादिग्विजय बखरीच्या आधारे रियासतकार सरदेसाई शहाजीपुत्र संभाजीचा जन्म १६१९ चा मानतात. वा. सी.बेंद्रे संभाजीचा जन्म १६२०-२१ सालीचा मानतात. पण विठोजीपुत्र संभाजी १६२३ पर्यंत जीवंत असून तो असतांना पुन्हा त्याचे नाव देणे, हे शक्य वाटत नाही. म्हणून वरील दोन्ही साल चुकीचे वाटतात. देवीसिंह चौहान यांनी संभाजीचा जन्म १६२३ चा मानलेला आहे. संभाजीचे १६२९ साली लग्न झाले. जर संभाजीचा जन्म १६२३ चा मानला तर लग्नासमयी त्याचे वय फक्त ६ वर्षांचे येते. त्याचे वय ६ वर्षांचे असल्यास त्याच्या वधूचे वय निदान ५ वर्षांचे मानावे लागेल. त्याकाळी लहान वयात लग्न व्हायची. पण शिवाजी राजांचे पहिले लग्न आणि त्याचा मुलगा राजारामाचे लग्न १०व्या वर्षी लग्न झाले. यांच्या वधू त्यावेळी ७ ते ९ वर्षांच्या असाव्या. म्हणून शहाजीपुत्र संभाजीचे वयाच्या ६ व्या वर्षी लग्न योग्य वाटत नाही. संभाजीच्या जन्मकालाची निश्चिती साधनांच्या अभावी करता येत नाही.
१६२४ साली निजामशाही आणि आदिलशाही यांच्यात भातवडी येथे लढाई होऊन त्यात शहाजीने पराक्रम दाखवला आणि शरीफजी मृत्यूमुखी पडला. यावेळी उभयता बंधु निजामशहाकडून लढले. १९ डिसेंबर १६२५ रोजीच्या मजहरात ‘साहाजी भोसला येदीलशाही’ असा उल्लेख येतो. त्यावरून डिसेंबर १६२५च्या पूर्वी शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीत गेला. शहाजी आदिलशाहीत जुलै १६२५ च्या आधी गेला असावा. आदिलशहाने त्यास ‘सरलष्कर’ हा खिताब दिला. त्याने स्वतःस सरलष्कर म्हटल्याचा जुना उल्लेख जुलै १६२५ चा येतो. त्यावरून तो आदिलशाहीत जुलै १६२५ च्या सुमारास गेला असावा. शहाजी आदिलशाहीत सुमारे १६२८ पर्यंत होता. कारण शके १५४९ च्या फाल्गुन शु.१५ (८-३-१६२८) रोजी त्याने स्वतःस सरलष्कर म्हटलेले आहे. त्यानंतरच्या शके १६५०च्या श्रावणातील कागदावर(२५-७-१६२८) त्यास सरलष्कर हा किताब नाही. त्यानंतर शहाजी निजामशाहीत आला.
‘नंतर काही दिवसांनी तो (संभाजीच्या लग्नाचा) समारंभ आटोपल्यावर व्याह्याच्या संमतीने आपल्या गरोदर पत्नीस स्वजनांसह त्याच किल्ल्यावर ठेवून शहाजी राजा दर्याखानास जिंकण्यास निघाला’, असा उल्लेख शिवभारतात येतो. दर्याखानाची स्वारी १६२८ची आहे. त्याच वेळी जिजाबाई गरोदर होती. त्यामुळे संभाजीच्या लग्नाचे वर्ष १६२९-३० चे असावे. संभाजीचे लग्न विश्वासराजाच्या कुळांतील सिद्धपालाचा मुलगा विजयराज याच्या कन्येशी- जयंतीबाईशी- झाले. हा विजयराज निजामशाही सरदार असून तो शिवनेरी किल्ल्यावर राहत असे. शहाजीचा कनिष्ठ बंधु शरीफजीचा विवाह विश्वासराजाच्या मुलीशी झाला होता, ती मुलगी ह्याच कुळातील असावी. तोच ऋणानुबंध लक्षात घेऊन शहाजीने आपल्या मुलाचे लग्न जयंतीबाईशी केले असावे आणि त्याच ऋणानुबंधामुळे अत्यंत विश्वासाने जिजाबाईस आणि इतरांस शिवनेरीवर ठेवले असावे.
पुढे २५ जुलै १६२९ साली लखुजीराव जाधव आणि त्याच्या ३ मुलांचा निजामशाही दरबारात खून झाला. त्यामुळे इतर जाधव मंडळींनी निजामशाही सोडून मोगलांची नोकरी पत्करली. शहाजीनेही तोच मार्ग अनुसरत नोव्हेंबर १६३० मध्ये आजमखानामार्फत मुघलांची नोकरी पत्करली. त्यास व त्याच्या भावांस बादशहाने मनसबी दिल्या. त्यात शहाजीस ५ हजार जात/ ५ हजार स्वार आणि त्याचा पुत्र संभाजीस २ हजार स्वार/ २ हजार जात अश्या मनसबी मिळाल्या. शहाजीला एक मानाचा पोशाख, एक हत्ती, घोडा, खंजीर, झेंडा, नगारा व दोन लाख रुपये तर संभाजीस एक मानाचा पोशाख व घोडा अश्या भेटी आजमखानाने दिल्या. पुढे बादशहाने शहाजीची जहागीर फत्तेखानास दिली. याची त्याला चीड येऊन त्याने मोगलांविरुद्ध बंड पुकारलं. ह्या बंडास आदिलशहाचाही पाठिंबा असावा. म्हणून २३ जुलै १६३२ रोजीचं मुहम्मद आदिलशहाने गदगच्या देसायांना पाठवलेले एक फर्मान आहे. त्यात मीर अली रजा याच्याकडे असलेला गदग परगण्यातील सर्व गावाचा मोकासा संभाजीच्या नावे केलेला आहे. कदाचित हि शहाजीला आर्थिक मदत असावी. मुघलांनी पुढे दौलताबादचा किल्ला जिंकल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर १६३३ मध्ये १० वर्षाच्या मूर्तजा नावाच्या निजामशहाच्या वंशास पेमगिरी किल्ल्यावर गादीवर बसविले.
पुढे शहाजीने शिवाजीराजे, जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांसह पुण्यास पाठविले. त्यावेळी दादोजीने पुण्यात शिवाजीराजांसाठी लाल महाल बांधला. त्याच प्रमाणे संभाजीसाठीही एक वाडा बांधला. वेदमूर्ति खंडभट शालिग्राम यांच्या वाड्यापर्यंत उत्तराभिमुख जोते असलेला हा वाडा होता.
शहाजीच्या एवढ्या हालचालीत आणि धामधुमीच्या राजकारणात संभाजीच्या सक्रिय सहभागाचे उल्लेख आढळत नाही. शहाजी मुघलांकडे जातो, त्यावेळी संभाजीसही मनसब मिळते, याचा उल्लेख वर आलेला आहे. याव्यतिरिक्त संभाजीच्या नावाचा उल्लेख या शहाजीच्या हालचालींमध्ये फारसा आढळत नाही. याचा एक अर्थ असा असावा की यावेळीपर्यंत संभाजीचे वय राजकारणात किंवा लढायांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे नसावे. पण साधनांच्या अभावामुळे कोणताही तर्क किंवा कोणताही निर्णय करता येत नाही.
शहाजहान बादशहा १६३६च्या आरंभी दक्षिणेत आला. त्याने शायिस्ताखानास शहाजीचा मुलुख घेण्याचा आदेश दिला. फेब्रुवारी-मे १६३६ मध्ये आठ हजार स्वारांच्या फौजेसह नाशिक, त्रिंबक, संगमनेर हा प्रदेश काबीज करण्यासाठी शायिस्ताखान निघाला होता. अहमदखानाने शाहजीच्या लोकांकडून रामसेजचा किल्ला घेतला. पुढे ८ मार्च १६३६ रोजी शायिस्ताखान संगमनेरास पोहचला. त्याने त्या बाजूचे परगणे संभाजीकडून हस्तगत करण्यास सुरवात केली. शत्रू नासिककडे गेल्याचे समजताच त्याने आपली माणसे त्या भागात पाठवली. खान-इ-खानान यास जुन्नरकडे पाठविले. अहमदनगरचा मुलुख सैनिकांवाचून मोकळा आहे तेव्हा शायिस्ताखानास तिकडे जाण्याचा हुकूम मिळाला. तो निघताच त्यास बाकिरच्या लिहिण्यावरून कळून आले, कि बाकिर शाहजीच्या मुलाच्या पाठलागावर कोकणच्या बाजूस गेला आहे व जुन्नरास फार थोडे लोक शिल्लक असल्याने ५०० लोक सय्यद अली अकबरच्या हाताखाली पाठविले. बंडखोर माहुलीकडे गेल्याचे समजताच बाकिर तिकडे गेला. यावेळी संभाजी चांभारगोंद्याकडे होता म्हणून बाकिर तिकडे गेला. तिकडून बाकीर जेथे शहाजीची मुलेमाणसे होती तेथे - जुन्नरकडे आला. येथे उभयपक्षाची लढाई सुरू झाली.
शायिस्ताखानास हि बातमी समजताच त्याने ७०० लोकांची कुमक जुन्नरकडे पाठवली. कुमक जुन्नरात पोहचू नये, म्हणून विरुद्ध पक्षाने प्रयत्न केले. तरी कुमक जुन्नरास पोहचली. पण या लोकांस रसदेची कमतरता जाणवल्याने त्यांनी शायिस्ताखानाकडे मदत मागितली. खान आपल्या थोड्याच सैनिकांसह शहरात आला आणि शत्रूस परगंदा केले. भिवरेच्या तिरापर्यंत पाठलाग करून कित्येकास कापून खान माघारी फिरला. जुन्नरचा किल्ला जिंकणे शक्य वाटत नसल्याने त्याने बाकिरास बोलावून शहराच्या रक्षणास ठेवले व स्वतःने जुन्नर व संगमनेर हे परगणे जिंकले. पुढे निजामशाही प्रदेश जिंकून शहाजहानने शहाजीस पराभूत केले आणि याचबरोबर निजामशाहीचा अंत झाला.
निजामशाहीचा अंत झाल्यावर शाहजी आदिलशाहीत आला आणि रणदौलाखानाच्या नेतृत्वात त्याने दक्षिणेत ३ वेळा स्वारी केली. १६३७ मध्ये पहिली स्वारी करून ह्या उभयतांनी इक्केरीच्या विरभद्र नायकाचा पराभव केला. दुसऱ्या स्वारीत रणदौलाखानाबरोबर अफजलखान आणि शाहजी होते. अफजलखानाची रवानगी शिऱ्यास झाली तर शाहजी बंगलोरवर चालून गेला. अफजलखनाने शिऱ्याच्या कस्तूरीरंग नायकास दग्याने मारून त्याचा पराभव केला आणि शाहजीने केपगोंडा नावाच्या अंमलदारास पराभूत करून बंगरुळ हस्तगत केले. नंतर रणदौलाखान स्वतः तेथे गेला आणि बंगरुळावर शहाजीची नेमणूक केली. यावेळी बंगरुळास इसलामपुर नाव देण्यात आले. १६३९-४० मध्ये तिसरी स्वारी झाली त्यात बसवापट्टण, चिक्कनायकहळ्ळी, बेलूर, टुमकुर इ. स्थळे काबीज केली.
शहाजीने बंगरुळ जिंकल्यानंतर तो बंगरुळासच राहत असे. बंगरुळास त्याची राहणी अत्यंत विलासी होती. त्याची दिनचर्या एखाद्या राजाला शोभेल अशी होती. त्याने आपल्या पदरी अनेक कवी बाळगलेले होते. जयराम पिंड्ये कृत राधामाधवविलासचंपूत त्याचे अत्यंत रसाळ वर्णन कवीने केलेले आहे. शहाजीच्या ह्या राजेशाही थाटास शोभेल अशी एक गोष्ट म्हणजे, त्याने आपल्या पुत्राचा यौवराज्याभिषेक केलेला असावा. संभाजीस युवराज पद असावे. याव्यतिरिक्त आदिलशहाने शहाजीस पाठवलेल्या अनेक फर्मानांमध्ये त्यास ‘फर्जंद’ म्हटलेले आहे. ‘फर्जंद’ हि उपाधी बादशहाच्या उच्च सरदारांस बादशहा लावत असे. फर्जंद’ म्हणून शाहजीचा आदिलशहाने केलेला जुन्यात जुना उल्लेख हा ३० जानेवारी १६४२ चे असून, त्यास ‘फर्जंद’ हा किताब त्या आधी मिळाला असावा.
१६४३-१६४४ मध्ये रणदौलाखानाचा मृत्यू झाला. रणदौलाखान हा शाहजीचा मित्र होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागेवर मुस्तफाखान खानबाबा याची नेमणूक केली. इकडे शाहजीचे वाढते महत्व, हिंदु नायकांस त्याचा वाढता पाठिंबा बघता दरबारातील काही लोकांस तो अडचणीचा वाटू लागला. मुस्तफाखान हा कडवा मुसलमान होता. कर्नाटकातील नायक शाहजीच्या आज्ञेत वागू लागले. म्हणून मुस्तफाखानाने शाहजीचा विश्वास संपादन केला आणि एके रात्री आपल्या सरदारांस बोलावून शाहजीच्या अटकेची योजना आखली. पहाटे मुस्तफाखानाचे लोक शाहजीवर चालून गेले. बेसावध असलेल्या शाहजीच्या तुकडीने प्रतिकाराचा प्रयत्न केला. त्या लढाईत शहाजी बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला. त्या अवस्थेत मुस्तफाखानाने शहाजीस कैद केले. शहाजीस कैद केल्याची बातमी संभाजीस कळताच त्यास मुस्तफाखानाचा अत्यंत संताप आला. त्यावेळी तो बंगरुळास होता. शिवाजीनेही हि बातमी ऐकून आदिलशहाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. ‘बंगरुळी राहणारा माझा भाऊ तेथे युद्ध करेल आणि मी ह्या गडांचे रक्षण करीत शत्रूशी ससैन्य लढेल’ असे वाक्य शिवाजीराजांच्या तोंडी शिवभारत ह्या समकालीन ग्रंथात आहेत.
शहाजीस कैद करून त्यास बादशहाकडे नेण्यात आले. बादशहाने शहाजीचा प्रदेशाचा ताबा घेण्यासाठी फत्तेखानास शिवाजीराजांविरुद्ध पाठवले तर बंगरुळ घेण्यासाठी मुस्तफाखानाने तानाजी डूरे, विठ्ठल गोपाळ आणि फरादखान यांची संभाजीवर रवानगी केली. ह्या सर्वांचा संभाजी व शिवाजीने पराभव केला. फरादखानाचा मोड केल्याबद्दल शिवभारतकार आदिलशहाच्या तोंडी अत्यंत मार्मिक वाक्य टाकतो. फरादखानाचा पराभव केल्यानंतर आदिलशहा विचार करतो, “आपल्या पित्यासाठी संभाजीने तिकडे फरादखानाचा पराभव केला आणि इकडे शिवाजीने युद्धामध्ये फतेखानासहि पळवून लावले. त्या विजयी संभाजीने तिकडे फरादखानाचा मोड केला नाही तर माझेच मन आज ह्याने भग्न केले आहे. केवढे मोठे त्याचे सामर्थ्य हे!” आदिलशहाच्या शिवाजीराजांवरील फत्तेखानाच्या स्वारीची बरीच माहिती मिळते पण, संभाजीवरील फरादखानाच्या स्वारीचा शिवभारत सोडून इतरत्र कुठेही उल्लेख नाही. फत्तेखानास पराभूत करून शिवाजीराजांनी शहाजहानचा मुलगा मुरादबक्ष याच्याशी पत्रव्यवहार केला. त्या पत्रात त्याने शहाजीने मुघलांविरुद्ध केलेल्या बंडाच्या गुन्ह्याची माफी मागून जुन्नर व अहमदनगर येथील देशमुखीची मागणी केलेली आहे. ह्या शिवाजी-मुरादबक्ष यांच्या संपर्काचा सुगावा आदिलशहास लागला असावा. त्यामुळे त्याच्यावर दडपण आले असावे. याशिवाय संभाजी आणि शिवाजी यांनी अनुक्रमे फरादखान आणि फत्तेखानाचा पराभव केल्याने आदिलशहाने शाहजीच्या सुटकेचा निर्णय घेतला. शिवाजीने सिंहगड आणि संभाजीने बंगरुळ देऊन शाहजीची सुटका करून घ्यावी, अशी अट बादशहाने घातली. त्यानुसार देऊन १६ मे १६४९ रोजी शहाजीची सुटका झाली.
यापुढील संभाजीच्या आयुष्याविषयी निश्चित माहिती मिळत नाही. संभाजीचा मृत्यू नक्की कधी झाला, याबद्दल मतांतरे आहेत. ९१ कलमी बखर, चिटणीस बखर, शिवादिग्विजय बखर, शेडगावकर भोसले बखर ह्या बखरी संभाजीराजे कनकगिरीच्या लढाईत तोफेचा गोळा लागून मारले गेल्याचे सांगतात. अज्ञानदासाच्या पोवाड्यात अफजलखानाने दगा केल्याचे उल्लेख आहेत. २५ फेब्रुवारी १६५४ रोजी संभाजीस उमाजी नावाचा पुत्र झाल्याचा उल्लेख जेधे शकावलीत आहे. याचा अर्थ संभाजी फेब्रुवारी १६५४ पर्यंत जीवंत असावा. ४ एप्रिल १६५४ रोजीचे संभाजी राजे नावाचे एक इनाम पत्र उपलब्ध आहे. जर तो शहाजी पुत्र संभाजी असेल तर, संभाजीची आयुमर्यादा ४ एप्रिल १६५४ पर्यंत वाढवता येते. याशिवाय १४ मे १६५७ रोजी शिवाजीराजांना पुत्र होऊन त्याने त्याचे नाव संभाजी ठेवले. आपला सख्खा मोठा भाऊ जीवंत असतांना त्याचे नाव आपल्या मुलास ठेवण्याची प्रथा त्याकाळी नव्हती. त्यामुळे शहाजी पुत्र संभाजीचा मृत्यू संभाजीचे बारसे होण्यापूर्वी मे-जून १६५७ पूर्वी झाला असावा. कनकगिरीच्या ज्या मोहिमेत संभाजीचा मृत्यू झाल्याचे काही साधने सांगतात, ती कनकगिरीची मोहीम जानेवारी १६५५ पूर्वी झाली असली पाहिजे. कारण १६ जानेवारी १६५५ रोजीचे आणि २१ जानेवारी १६५५ च्या पत्रात पुणे परगण्यात कनकगिरीपट्टी नावाचा कर बसविल्याचा उल्लेख आहे. मोहिमेचा खर्च भागवण्यासाठी अश्या प्रकारचा कर पूर्वी बसवत असत. संभाजीचा मृत्यू कनकगिरीच्याा वेढ्यात झाला, असे गृहीत धरल्यास त्याचा मृत्यू जानेवारी १६५५ पूर्वी झाला असला पाहिजे. सिद्धी जौहरचा वेढा सुरू असतांना नेतोजी पालकर हा कर्नाटकात होता. तो राजगडास आल्यानंतर जिजाबाईने त्याची निर्भत्सना केली व माझ्या ‘एकुलत्या एक पुत्रास’ मी स्वतः सोडवून आणीन, असे जिजाबाई नेतोजीस म्हणाली, हि माहिती शिवभारतात येते. सिद्दी जौहरचा पन्हाळ्यास १६६० साली वेढा होता. याचा अर्थ संभाजीचा १६६० पूर्वी मृत्यू झाला असला पाहिजे.
वा.सी.बेंद्रे यांनी आपल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे वडीलबंधु संभाजीराजे भोसले’ या पुस्तकात संभाजीचा मृत्यू १६६३ पर्यंत ओढलेला आहे. त्यासाठी त्यांनी शिलालेखांचा आधार दिलेला आहे. या शिलालेखात संभाजीस ‘श्रीमद राजाधिराज महाराज’ यांसारखे विशेषणं वापरलेले आहेत. शहाजी जीवंत असतांना असे राजा असल्यासारखे विशेषण संभाजी स्वतःस लावणार नाही असे वाटते. यावरून हा तोच संभाजी असावा का याबद्दल शंका येते. हि शंका आणखी बुचकळ्यात टाकणारा एक उल्लेख सापडतो. हा उल्लेख म्हणजे जयिताबाई नावाच्या स्त्रीने भाऊजीपंत यास जमीन इनाम दिल्याचा शिलालेख आहे. ह्या जयिताबाईचा उल्लेख शिलालेखात ‘संभाजी राजाची पत्नी’ असा करण्यात आलेला आहे. संभाजीच्या पत्नीचे नाव जयंतीबाई होते, असे शिवभारतात आलेले आहे. त्यामुळे इतर शिलालेखात उल्लेखित संभाजी शहाजीपुत्र असावा का, असा संशय वाटतो. ह्या शिलालेखात उल्लेखित संभाजीराजाचा शेवटचा उल्लेख १६६३ च्या दानाच्या शिलालेखात आढळतो. जसा १६६३ चा संभाजीचा शेवटचा उल्लेख आढळतो, त्याच्याच विरुद्ध एक उल्लेख १६६२ च्या एका शिलालेखात आढळतो. हा शिलालेख एकोजी राजाचा असून त्यात ‘ during the government of Enkoja-Raja: — the havaldar of Rahadurga, Baranaji-Raja, granted a nettara-kodige for Simangala Chikka-Deva's son Tiramapa.’ असा उल्लेख येतो. जर संभाजी १६६३ पर्यंत हयात होता तर १६६२ सालच्या शिलालेखात ‘एकोजीराजाच्या काळात’ असा उल्लेख का येतो?
जसे संभाजीचे हे शिलालेख सापडलेले आहेत, त्याचप्रमाणे जयिताबाईचेही (जयंतीबाई ?) शिलालेख सापडलेले आहेत. तिचे १६९३ पर्यंतचे शिलालेख सापडलेले असून काही शिलालेखात तिला शिवाजीचा मुलगा संभाजीची बायको म्हटलेले आहे. पण ते चूक असून ती शहाजीपुत्र संभाजीची बायको असावी.
संभाजीस उमाजी नावाचा एक मुलगा होता. त्याचा जन्म २५ नोव्हेंबर १६५४ रोजी झाला. संभाजीस सुरतसिंह नावाचा मुलगा असल्याचे रियासतकार गो. स. सरदेसाई सांगतात. पण त्याला पुरावा त्यांनी दिलेला नाही. कर्नाटकात सापडलेल्या शिलालेखांमध्ये संभाजीस मालुकोजी किंवा माणकोजी नावाचा एक मुलगा असल्याचा उल्लेख येतो.
संभाजी आणि शिवाजीराजांचा फारसा संबंध येत नाही किंवा तसे सांगणारे कागदपत्र उपलब्ध नाहीत. शिवाजीराजांनी संभाजीस एक गाव दिल्याचा उल्लेख सापडतो. इंदापूर परगण्यातील मौजे बोरी हे गाव ३०-१०-१६४६ रोजी शिवाजीराजांनी संभाजीस दिले. इंदापुरचा मोकासा शिवाजीस अर्जानी झाला म्हणून मोकदमीचे हक्क कायम केल्याची दोन पत्रे ३०-१०-१६४६ ची आहेत. संभाजीचा मुलगा उमाजी यास बहादूरजी नावाचा मुलगा होता. उमाजी पुढे आपल्या बायकोसह – मकुबाई- आपल्या मुळ जहागिरीकडे महाराष्ट्रात आला असावा. त्याने जिंतीची आपली देशमुखी घेण्याची खटपट केली. महादजी व बाजी देवकर यांना देशमुखीवरून हाकलून ती हडपण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्या उद्योगात काही यश येण्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला असावा. पुढे १६८९ मध्ये औरंगजेब बादशहाकडून त्याच्या शक्क्यानिशी पत्र आणवून बहादूरजीने आपली वडीलोपार्जित जहागीर ताब्यात घेतली. उमाजी आपल्या जुन्या वतनी गावी आला तरी, जयंतीबाई मात्र आपल्या इतर मुलाबरोबर कर्नाटकातच होती. १६९३ पर्यंतचे तिचे दानाचे शिलालेख आढळले आहेत. पुढे मकुबाई म्हणजे उमाजीची बायको हिचे शाहूशी सख्य असल्याचे दिसून येते. १७०३ सालचा मकुबाई भोसलेचा मोकदम म्हणून उल्लेख एका मजहरात येतो. कदाचित १७०३ सालच्या आधी बहादूरजीचाही मृत्यू झाला असावा. त्यामुळे देशमुखीचा कारभार मकुबाई पाहत असावी. तीचा देशमुखीचा शिक्काही उपलब्ध आहे. शाहू किंवा बाळाजी पेशवा तीचा उल्लेख ‘मातुश्री’ म्हणून करत असत. १७२३ साली छत्रपती घराण्यात कोणाचे तरी लग्न असावे. त्या लग्नासाठी शाहूने मकुबाईस बोलावले होते व वाटखर्चाबद्दल ४६ रुपये दिले. हि शेवटपर्यंत जिंतीसच राहत असावी.जिंतीस तिची समाधी आहे. यानंतर मात्र ह्या वंश्याविषयी फारशी माहिती मिळत नाही.
लेखाच्या समाप्तीकडे जाण्याच्या आधी संभाजीच्या जन्मासालाबद्दल आणि लग्नासालाबद्दल साधनांच्या अभावी वर जो थोडा गोंधळ झालेला आहे, त्यास सोडविण्याचा अल्पसा प्रयत्न येथे करतो. विठोजीपुत्र संभाजी हा १९ फेब्रुवारी १६२३ ते २७ फेब्रुवारी १६२३ ह्या कालावधीत खंडागळे हत्ती प्रकरणात मृत्युमुखी पडला, हे वर सांगितलेले आहे. याचा अर्थ शहाजीपुत्र संभाजीचा जन्म फेब्रुवारी १६२३ नंतरचा आहे. पण १६२३ सालचा संभाजीचा जन्म जर मानला तर शिवभारतकाराने दिलेल्या संकेतानुसार १६२९ साली ह्या संभाजीचे लग्न झाले.पण ह्यावेळी त्याचे वय केव्ळ ४-५ वर्षांचे येते. त्या काळात बालविवाहास संमती असली तरी इतक्या लहान वयात लग्न होईल, असे वाटत नाही. त्यामुळे हा घोळ कसा सोडवावा, याबद्दल येथे विचार करू. हा घोळ सोडविण्याचा एक मार्ग आहे. बुसातीन-उस-सलातीन ह्या फारसी ग्रंथात संभाजीच्याा लग्नाचा उल्लेख आहे. त्याआधी दिलेल्या घटनांचा विचार करता ह्या फारसी ग्रंथावरून संभाजीच्या लग्नाचे वर्ष १६३३ येते. १६३३ हे साल जर संभाजीच्या लग्नाचे मानले आणि १६२३ साल जन्माचे मानले, तर लग्नाच्या वेळी संभाजी १० वर्षांचा असला पाहिजे. शिवाजी महाराजांचे पहिले लग्न १० वर्षांचे असतांना झाले होते. त्यामुळे संभाजीच्या वयाचा आणि त्याच्या पूर्वायुष्यातील विवाहादि घटनांचा बरोबर मेळ बसतो. पण बुसातीन-उस-सलातीन मध्ये दिलेल्या घटनांचा इतर साधनांशी पडताळून पाहिल्यास क्रम चुकीचा वाटतो. त्यामुळे गुरुवर्य ग. भा. मेहेंदळे यांनी १६३३ हे साल चुकीचे मानले आहे. संभाजीच्या जन्माबद्दल आणि लग्नाबद्दल अधिक खुलासा साधनांच्या अभावी करता येत नाही. जर १६३३ साल त्याच्या लग्नाचे मानले तर हा घोळ सुटतो, पण विश्वसनीयतेचा प्रश्न उभा राहतो. असो.
संभाजीचे एकंदरीत आयुष्य पाहता, तो अत्यंत पराक्रमी दिसतो. शहाजीराजांची रसिकता त्याच्याही अंगी असली पाहिजे. मराठी, संस्कृत, फारसी इ. भाषा त्यात अवगत असाव्या. पण त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत एक-दोन घटना सोडल्या, तर इतर कोणतीही घटना निश्चित होत नाही. संभाजीचे वंशज सध्या जिंती ता.करमाळा जि. सातारा येथे वास्तव्यास आहेत. शहाजीराजे भोसले, त्यांच्या पत्नी सवितादेवी भोसले व युवराज शिवाजी राजेभोसले हे आपल्या पिढीजात वाड्यात वास्तव्यास आहेत.
शहाजीच्या चरित्रात संभाजीचे जेवढे उल्लेख येतात, त्यावरून त्याच्या चरित्राचा सांगाडा बांधावा लागतो. कदाचित त्यामुळेच वा.सी.बेंद्रे यांनी लिहिलेले चरित्र सोडले, तर इतर त्याचे स्वतंत्र चरित्र नाही. त्यामुळे संभाजीचे एक स्वतंत्र चरित्र लिहून बेंद्रेंनी एक महत्वाचं काम ५७ वर्षांपूर्वी केलेले आहे. संभाजी आणि त्याच्या वंशजांबद्दल संशोधनास वाव आहे. त्याबद्दल तंजावरच्या ग्रंथालयात शोध घेतला पाहिजे. शिवाजी-संभाजी-राजाराम ह्या भोसल्यांच्या शाखेने स्वतःच वेगळं राज्य उभारलं, त्यामुळे त्यांस एक वेगळं महत्व प्राप्त झालं. कर्नाटकात व्यंकोजीची शाखाही प्रसिद्ध आहे. पण ह्या संभाजीच्या जिंती शाखेबद्दल जनमानसात तितका प्रचार आणि प्रसिद्धी नाही. ह्या शाखेची प्रसिद्धी कदाचित साधनांच्या अभावी असलेल्या माहितीच्या अभवामुळे खुंटली असावी. जनमानसात ह्या शाखेचाही प्रचार व्हावा, यास्तव हा लेखप्रपंच.
© अनिकेत वाणी
“तुळजाभवानीचे प्रतिरूप करमाळ्याची कमलाभवानी”...
करमाळ्याच्या पूर्वेला दोन किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवरील मंदिरातील करमाळ्याची आराध्य देवता श्री कमलाभवानी माता ही महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते...
१७ व्या शतकामध्ये मराठा सरदार व तुळजाभवानीचे उपासक राजेरावरंभा निंबाळकर यांच्या काळात करमाळ्यामध्ये कमलाभवानी मातेचे वैशिष्ट्यपुर्ण मंदिर बांधकाम व देवीची प्रतीष्टापना करण्यात आली आहे...कमलाभवानीचा इतिहास पाहिला तर मराठा सरदार राजेरावरंभा निंबाळकर यांच्या उपासने मुळेच तुळजापूरची तुळजाभवानी माताच करमाळ्यात दाखल झाल्याचे सांगण्यात येते...
तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानल्या जाणाऱ्या करमाळ्याच्या कमलाभवानी मातेला मोठा इतिहास लाभला आहे करमाळ्याच्या पूर्वेकडील उंच माळावर वैशिष्ट्यपुर्ण स्थापत्यकलेचा नमुना असणारे कमला भवानीचे मंदीर आहे...
१७ व्या शतकात बांधण्य़ात आलेले आहे हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसत आहे उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायऱ्यांची चढण आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री कमलाभवानी मातेची ४.३ फुटाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानीमाता अष्टभुजा आहे...
मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे गाभाऱ्यात श्री विष्णु-लक्ष्मिची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभाऱ्यात सुर्यानारायनाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे...एकाच मंदिरात पाच देवतांचे शक्तीपंचायतन असलेले करमाळ्यातील कमलाभवानी मातेचे मंदिर दुर्मीळ आहे तसेच कार्तिक स्वामीची मूर्ती देखील या मंदिरामध्ये पहावयास मिळेल. या शिवाय मुख्य मंदिराच्या समोर तीन गगनचुंबी गोपुरे आहेत...
शहरामध्ये कोणत्याही बाजूने प्रवेश करताना दुरवरूनच देवी मंदिराचे स्थान दर्शविणारी ही गोपुरे उत्कृष्ट बांधणीची साक्ष देत उभी आहेत मंदिर बांधणीचा विचार केला तर या मंदिर बांधकामात ९६ या आकडयाला फारच महत्व दिल्याचे स्पष्ट होत आहे कारण ७५ फुट लांबी व ६५ फुट रुंदीच्या या मंदिराची उभारणीच ९६ खांबावर झाल्याचे दिसत आहे...
हे घोडे मी प्राणप्रिय रावरंभासाठी घेतले !
( Danik Ekmat News) 26-09-2015 08:04:11 PM
मराठ्यांचा इतिहास हा पराक्रमासोबतच अंतर्गत कलह आणि उच्च-नीचतेचा भेदभाव यानेच जास्त गाजलेला आहे. मनगटाच्या जोरावर गाजविलेल्या तलवारीपेक्षा जन्माने मिळालेले श्रेष्ठत्व मोठे होते. म्हणूनच रानावनात लपवून ठेवलेली माणसं छत्रपती झाली तर केवळ कुळाचा दोष काढत सरदार महादजी शिंदे किंवा रावरंभा निंबाळकर यांसारख्या कर्तृत्ववान लोकांना मराठ्यांनी पाहिजे तो सन्मान कधी दिलाच नाही. नेहमी निजामशहा किंवा आदिलशहाकडे चाकरी करणा-या निंबाळकर घराण्याने रावरंभाला आपलं कधी मानलं नाही. मराठेशाही तोलून धरणा-या महादजी शिंदे व त्यांच्या पुढील पिढीला जे वैभव लाभलं ते हैदराबादची निजामशाही एकखांबी तंबूवर तोलून धरणा-या रावरंभाला पुढे मिळालं नाही. परंतु त्याने रावरंभाची योग्यता कमी होत नाही. इतिहासाची विनंती एकच आहे, माणसाच्या जन्माचा नाही तर कर्माचा विचार करा.
फलटणचे निंबाळकर घराणे म्हणजे शहाजीराजे ते संभाजीराजांचे मातृकूळ. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे सासर असूनही स्वराज्याच्या उभारणीप्रसंगी निंबाळकरांनी मुस्लिम सत्ताधीशांच्या चाकरीत धन्यता मानली. तरीपण स्वतंत्रपणे तलवार मारणा-या रावरंभाकडे नेहमी वेगळ्या चष्म्यातून पाहिले. शिवरायांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकरांचे पुत्र महादजीला संभाजीराजांच्या बहीण सखूबाई दिल्या होत्या. याच महादजीचा नातू बाजी निंबाळकरांपासून रंभाजीचा जन्म झाला. औरस, अनौरस या वादामुळे रंभाजीच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजीची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली. १७०७ ला औरंगजेबाच्या निधनानंतर मराठ्यांची गादी ही
सातारा आणि कोल्हापूर अशी विभागल्याने अंतर्गत कलह वाढल्याने चंद्रसेन जाधव, हिंमतबहाद्दुर उदाजी चव्हाण, नेताजी शिंदे, मानाजी फाकडे व रंभाजीसारखे सरदार निजामाला जाऊन मिळाले. त्यामुळे निजामाचे आसन स्थिर झाले व त्याने रंभाजीला रावरंभा ही पदवी आणि ५२ लाखांची जहागिर दिली. रावरंभा घराण्यात रंभाजी, जानोजी, आनंदराव, बाजीराव, खंडेराव यांच्यासारख्यांनी शेवटपर्यंत निजामशाही तोलून धरली. प्रत्येकाला रावरंभा पदवी असल्याने या घराण्याच्या अभ्यासात बराच गोंधळ उडतो.
रावरंभाकडे पुणे, बारामती, श्रीगोंदा, तुळजापूर,
माढा, करमाळा आणि भूमची जहागिरी होती. निजामाच्या १२ मुख्य जहागिरदारांत रावरंभाचे स्थान वरचे असल्याने हैदराबादमध्ये रावरंभाची स्वतंत्र देवडी (कचेरी) होती तर औरंगाबादमधील जुन्या हायकोर्टालगतच्या आजच्या कोटला कॉलनीत रावरंभा बाजीरावाची हवेली होती.
रावरंभा घराण्यातील प्रत्येक पुरुष हा तलवार, कला, साहित्य, स्थापत्य यात रुची ठेवणारा होता. त्यापुढेच तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारासह, आतील ओव-या, माढा आणि करमाळ्यातील देवीची मंदिरे आदी त्यांच्या निर्मितीचे साक्षीदार आहेत. साखरखेर्डा, भालकी, फत्तेखेर्डा, राक्षसभुवन आणि उदगीर या लढाईतील रावरंभाचे योगदान विसरता येणार नाही. आज परंड्याच्या किल्ल्यावर दिसणारी तोफ जानोजी जसवंतराव रावरंभानेच पेडगावहून आणून बसविलेली आहे. महादजी शिंदे, बडोद्याचे फत्तेसिंग गायकवाड, सेनापती धनाजी जाधवांचे घराणे, कोल्हापूरचे छत्रपती, सरदार थोरात घराण्याशी रावरंभाचे वैवाहिक संबंध होते.
रावरंभा निजामाकडे असले तरी त्यांचे पेशव्यांबरोबर चांगले संबंध होते. किंबहुना त्यांच्यासारख्या सरदारामुळेच निजामाला मराठ्यांविरोधात एकाही लढाईत विजय मिळाला नाही. मराठ्यांबरोबरच रावरंभाचे इंग्रज, फ्रेंच यांच्यासोबतही चांगले संबंध होते. एकदा तर रावरंभाने निजामाला सोडून जाण्याची भाषा करताच राजा असूनही डोळ्यात पाणी आणून निजामाला रावरंभाकडे विनंती करावी लागली. यावरून त्यांची योग्यता स्पष्ट होते. एकही लढाई न करता निजामाने मराठ्यांशी केवळ तह करून २०० वर्षे राज्यकारभार केला; परंतु प्रत्येक लढाईने रावरंभाची जहागिर कमी होत गेली.तरीपण तुळजापूर, माढा, करमाळा, रोपळे, शेंद्री, भूम येथील विविध इमारती रावरंभाच्या वैभवाची साक्ष देऊन उभ्या आहेत.
पहिले रावरंभाचे वास्तव्य करमाळ्यात तर शेवटचे रावरंभा भूम (जि. उस्मानाबाद) या ठिकाणी राहिले. त्यांना गोजराबाई व ताराबाई या दोन मुली असून ताराबाई पुढे विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. सध्या रावरंभा घराण्याचे वंशज म्हणजे विजयसिंह थोरात हे असून ते भूमला राहतात. तर रावरंभाच्या भावाचे वंशज शेंद्री (ता. बार्शी) व रोपळे (ता. माढा, जि. उस्मानाबाद) येथे राहतात. तुळजाभवानीदेवीच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘सरदार निंबाळकर दरवाजा’ नाव दिले गेले तेही रावरंभावरूनच. अशा रीतीने सर्वच क्षेत्रांत नावाजलेल्या रावरंभाची कारकीर्द गाजली ती म्हणजे त्यांच्या कलासक्त स्वभावामुळे.
रावरंभा निंबाळकरांमध्ये रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दुर हे एका नर्तकीच्या प्रकरणावरून फारच
गाजले. हैदराबादच्या निजामाची राजवट म्हणजे निव्वळ नबाबशाही. त्यामुळे नाचगाण्याचा थयथयाट झाला.
सातवा निजाम मीर उस्मान अली खानचे सहा विवाह झाले शिवाय इतर ४२ स्त्रिया जनानखान्यात होत्या. त्यातून त्याला ५० मुले व ४४ दासीपुत्र झाले. हे उदाहरण फार बोलके आहे. चमेली, बिजली, लैला यांसारख्या नर्तकी असायच्या. परंतु त्या कालखंडात हैदराबाद संस्थानात अतिशय प्रसिद्ध अशी नर्तकी आणि गायिका होती. तिचे नाव होते माहलिका ऊर्फ चंदा. तिच्या गाण्यावर निजाम, दिवाणापासून अनेक सरदार फिदा होते. परंतु माहलिकाची मर्जी होती ती रावरंभावर.
माहलिकाची बिदागी ही सर्वसामान्याला परवडणारी नव्हती. माहलिकाकडे स्वतंत्र कोठी असून रावरंभाकडून तिला प्रतिमाह तीन हजारांची बिदागी मिळत होती. अप्रतिम लावण्य, गायन आणि नृत्यात पारंगत असणा-या माहलिकाकडे गडगंज संपत्ती होती. गुलाम हुसेनखानाने ‘तारिखे-गुल्जारे आसफिया’ नावाच्या ग्रंथात रावरंभा आणि माहलिकाचा वर्णिलेला किस्सा मनोरंजक आहे.
१० फेब्रुवारी १७८२ ला पुण्यामध्ये सवाई माधवरावांचा शाही विवाह असल्याने देशभरातील राजा-महाराजांसह अनेक नामांकित लोकांनी हजेरी लावली होती. पूर्वी विवाह हे ३०-४० दिवस चालायचे.
शाही विवाहामध्ये तर नाच-गाणे, विविध खेळ, मनोरंजनाबरोबरच विविध बाजार भरायचे. नाच-गाण्याकरिता तर देशभरातील सुप्रसिद्ध नर्तकींनी आपली हजेरी लावली होती. त्या वेळी खरं तर सर्वत्र व्यंकटनरसी नावाच्या नर्तकीचा बोलबाला होता. परंतु महालिकेने सर्वांना मागे टाकत पुणे गाजविले. साहजिकच सर्वत्र माहलिकाची चर्चा झाली. लग्नसमारंभानंतर वराती मंडळी बाजारहाट करण्याकरिता बाहेर पडली.
मराठा कालखंडात बाजारात सर्वांत मोठी गर्दी ही घोड्याच्या बाजारात व्हायची. त्यानुसार नाना फडणीसासह अनेक नामांकित लोक या बाजारात फिरत असताना सर्वांची नजर ६ घोडे घेऊन आलेल्या व्यापा-यावर
स्थिरावली. अफगाणी जातीचे पांढरेशुभ्र घोडे खरंच
मोठे देखणे होते. नानामुळे तेथे मोठी गर्दी ही घोड्याच्या
बाजारात व्हायची. त्यानुसार नाना फडणीसांसह
अनेक नामांकित लोक या बाजारात फिरत असताना
सर्वांची नजर ६ घोडे घेऊन आलेल्या व्यापा-यावर स्थिरावली.
अफगाणी जातीचे पांढरेशुभ्र घोडे खरंच मोठे देखणे
होते. नानांमुळे तेथे मोठी गर्दी वाढली. थोड्याच वेळात घोड्याच्या खरेदीसाठी बोली लागली. शे- दोनशेचे घोडे पण नानांनी त्यावर दीड हजार लावले. अवास्तव किंमत आणि खुद्द नानांची बोली लागल्याने कोणीच पुढे आले नाही. बोली एकवार, दोनवार आणि तीनवार... व्हायच्या आत गर्दीतून आवाज आला दोन हजार रुपये.... सर्वांच्या नजरा आवाजाकडे वळल्या आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एका नर्तकीने पेशव्यांना मागे टाकून २ हजाराने ६ घोडे घ्यावेत हे आश्चर्यकारकच होते. न राहून नाना स्वत: माहलिकेच्या जवळ आले आणि त्यांनी तिला प्रश्न केला, तुला कशाला हवेत घोडे? तेव्हा माहलिकेचे उत्तर ऐकून सर्वांचेच डोके सुन्न झाले, कारण माहलिका म्हणाली, हे सर्व घोडे मी माझ्या प्राणप्रिय रावरंभासाठी घेतले आहेत.
पुढे माहलिका-रावरंभाचे संबंध अधिकच दृढ होत गेले. त्यामुळे तिच्यावर जळणा-यांनी अनेक कट-कारस्थाने रचून तिला देशद्रोही बनवून अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु निजामाने रावरंभाला जवळ बोलावून शहानिशा करून घेतली. रावरंभावर जिवापाड प्रेम करणा-या माहलिकेने रचलेल्या कविता पुढे प्रचंड गाजल्या. त्यातील काही पंक्ती किती बोलक्या आहेत.
‘हरम को बनाये है बल दैर दिल मेंŸ।
तुझे जबसे हम अय सनम देखते हैŸ।’
अशा या नामांकित माहलिकेने हैदराबाद या ठिकाणी इ.स. १८२४ साली रावरंभाचा आणि जगाचा निरोप घेतला. इकडे शंभर वर्षांहून अधिक काळ रावरंभा किताब मिळविणा-या या घराण्याचे दिवसही आता फिरले. इ.स. १८०० साली निजामाने इंग्रजांशी तह करून तैनाती फौज स्वीकारली. निजामाने दिवाणाला बडतर्फ करून सर्व संस्थानिक सरदार व जहागिरदारांना नाममात्र पगारीवर आणले.
साहजिकच जड अंत:करणाने आपले आवडते शहर हैदराबादचा निरोप घेतला. खड्र्याच्या लढाईमुळे अगोदरच करमाळा त्यांच्या ताब्यातून गेल्याने भूम येथे छोटीशी जहागिरी राहिली होती. शेवटचे वास्तव्य त्यांचे तेथेच असून इ.स. १८५७ साली रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दर निंबाळकराने जगाचा निरोप घेतला. आज हैदराबादमध्ये माहलिकाची कबर तर भूम (जि.
उस्मानाबाद) येथे रावरंभाची समाधी आहे. पराक्रमी माणसाची कलाआसक्ती आणि निजाम व पेशवेकालीन स्त्री-पुरुष संबंधावर हा प्रकाशझोत आहे.
आजही माहलिकेचे प्रतीक म्हणून करमाळ्याच्या कमलादेवीच्या छबिन्यापुढे नाचण्याचा मान तिथल्या मूळ मुसलमान घराण्याकडे असून त्याकरिता इनाम जमीन आहे. निंबाळकर घराण्यात स्वकर्तृत्वाने पुढे आलेले रावरंभा हे एकमेव घराणे असूनही त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळालीच नाही. परंतु आजही आपण करमाळा शहरात पाऊल ठेवलं की समोर त्यांनी बांधलेले कमलादेवीचे भव्य मंदिर दिसते आणि तोंडात या ओळी येतात-
करमाळं शअर काई वाजत जाई जाईŸ।
तिथं नांदती अंबाबाईŸ।।
करमाळं शअर... रावरंभाचं वतयन
महादेवाचा छबिना जातो मारोतीवरणंŸ।।
डॉ. सतीश कदम
मोबा. ९४२२६ ५००४४
करमाळ्याकडे जाणाऱ्या राज्यमहामार्गापर्यंत येण्यास चार वाजले आणि भुकेने पोटातीळ सगळी प्राणिमात्रा आरडा ओरड करू लागली. उदरभरणाचा कार्यक्रम पार पडून करमाळ्यात प्रवेश केला. आमचा अवतार, गळ्यात लटकवलेले कॅमेरे बघून आम्हाला पहिला प्रश्न झाला, "शूटिंगला आलात का, कोणता पिक्चर?" आणि पुढे "सैराट" च्या सगळ्या शूटिंग लोकेशन्सची यादी आमच्या पुढे गावकर्यांनी उभी केली. वाह! आमच्या ह्या अवताराचा आम्हाला फायदाच झाला. कमलादेवीचे मंदिर आणि तेथील ९६ पायऱ्यांची विहीर हे या यादीत सगळ्यात आघाडीवर, पण आम्ही आमचा मोर्चा "थेट" किल्ल्याकडे वळवला. अबब! २९ बुरुज, गावभर पसरलेली दीड दोन मैल तटबंदी आणि त्यात वसलेले करमाळा शहर बघून आमचे इथवर येण्याचे श्रम सार्थकी लागले. जिकडे पाय ठेवावा तिकडे काही तरी बघण्या सारखे, फक्त तटबंदी वरून फेरफटका मारावा तरी दमछाक होण्याइतपत मोठा पसारा आहे.

देवीचा माळ
करमाळा गाठलं आणि जवळपास काय काय पाहता येईल याची शहानिशा केली.. इथे ५-७ कि.मी. वर संगोबा हे सीना नदीच्या काठचे जुने शिवमंदिर आहे आणि करमाळ्यापासून २-३ कि.मी. अंतरावर देवीचा माळ एका लहानशा टेकडावर बांधला आहे .. इथे कमलादेवीचे मंदिर आहे.. कमलादेवी हा भवानी मातेचा अवतार.. या देवीच्या माळावरून या शहराला करमाळा हे नाव पडले असे जाणकार सांगतात.. कमलादेवी / भवानी देवी मंदिराच्या भोवती दोन पदरी दगडी चिऱ्यांचा भक्कम कोट उभा केला आहे.. श्री. राव रंभा निंबाळकर या राजाने हा कोट बांधल्याचे काही लोक सांगतात.. पायऱ्यांवरून वर जाताच राजे राव रंभा निंबाळकर यांची समाधी दिसते.. मंदिराच्या मागच्या बाजूस.. राजघराण्यातील काही लोकांच्या समाध्या आहेत.. त्यामागे.. एक अजस्त्र विहीर आहे.. हि विहीर अष्टकोनी, सात पदरी आणि सुमारे १०० फुट खोल आहे.. अष्टभुजा कमलादेवी ची मूर्ती प्रगल्भ असून.. पंचक्रोशीत देवीचा महिमा प्रसिद्ध आहे.. देव दर्शन करून बाहेर येताच.. समोर दरवाजाच्या पुढ्यात आकाशाकडे झेपावणाऱ्या तीन दीपमाळा लक्ष वेधून घेतात.. या उत्तुंग दीपमाळेच्या आतून वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.. या देवीच्या माळातून पाहताना चाहुबाजूचा परिसर न्याहाळता येतो..
करमाळा किल्ला
देवदर्शन करून करमाळा किल्ल्याकडे मोर्चा वळविला.. S.T. stand पासून जवळच हा किल्ला आहे.. २१ बुरुजांचा आणि दोन दरवाजांचा हा किल्ला.. किल्ल्याला पूर्व-पश्चिम दरवाजा आहे.. पूर्वे कडील दरवाजातून आत येताच.. हनुमान मंदिर आणि उजवीकडे हेमाडपंती शंकराचे मंदिर आहे.. तटबंदीलगत कुणा एका पिराची कबर आहे.. किल्ला बाहेरून पाहताना जरी भक्कम वाटत असला तरी आत मात्र तटबंदी आणि बुरुज पोखरलेल्या अवस्थेत आहेत.. कधी ढासळतील याचा नेम नाही.. सदर किल्ला राव रंभा निंबाळकर यांनी बांधला असून आत त्यांचा राजवाडा आहे.. सध्या इथे कोर्ट भरवले जाते.. रंभाजी निंबाळकर हे संभाजी महाराजानंतर पुणे सुभ्याचे वतनदार झाले.. तद्नंतर त्यांना करमाळा जवळील वतन देण्यात आले.. साधारण १७ व्या शतकात हा किल्ला उभारल्याचे इतिहासकार सांगतात.. किल्ल्यावर एक आतून फेरफटका मारून किल्ल्यातील मारुती रायाचे दर्शन घेतले.. नंतर आंबी जळगाव इथे राहणारे आमचे पाहुणे प्रवीण कुलकर्णी यांच्याकडे निघालो.. तिथे त्यांच्या शेतावरच्या घरी थंडगार वाऱ्यात ताणून दिली.. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने.. वेडा राघु, भारद्वाज, देसी हमिंग बर्ड, माळचिमणी असे नानाविध पक्षी अंगणात मुक्तपणे विहार करीत होते.. फुकटातले पक्षी निरीक्षण करून कुगावचा जलसमाधी घेतलेला किल्ला पाहण्याचं नक्की केलं..
सातविहीर
सूर्यास्त
पण.... नेहमी प्रमाणे ह्यातील किती वास्तूंची आपण काळजी घेतली असे विचाराल तर मन खट्टू होण्याशिवाय दुसरे काही उत्तर मिळणार नाही. अतिक्रमणाने गडाचा श्वास कोंडला आहे, काही अवशेष तर कचरा टाकण्यासाठी उपयोगात येतात, चक्क पाण्याच्या बारव सुद्धा आपण सोडल्या नाहीत! मावळतीची दिशा सोनेरी होवोस्तर आम्ही किल्ला न्याहाळला आणि इथून पुढे गावकरी म्हणतील ती पूर्व दिशा समजून सगळी शूटिंग लोकेशन्स बघितली. आमची "आर्ची" (म्हणजे आमच्या सौ) फारच खूष झाली हा सगळा प्रकार बघून आणि तेवढीच स्तब्ध ही झाली, म्हणाली "आता इथेही व्यावसायिकरण होणार का हो?" असो. कमलादेवीचे मंदिर, त्यातील ३ उंच दीपमाळ आणि शेजारील ९६ पायऱ्यांची विहीर बघून आम्ही परतीच्या वाटेवर निघालो.
तसे रात्री दुचाकी चालवणे चुकीचे, पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कामावर परतणे आवश्यक होते आणि आमचा नाईलाज होता. परतीची वाट ही महामार्ग असल्यामुळे प्रवास थोडा सुकर झाला पण ही सफर दोन दिवसातच करणे योग्य असे सारखे वाटत होते. एका दिवसात पुणे - पळसदेव - टेम्भूर्णी - कुगाव - करमाळा - भिगवण - पुणे असा ४५० किमी प्रवास करून सोमवारी पहाटे ३ वाजता घरी पोहोचून आम्ही करमाळा मोहीम पूर्ण केली.
दीपमाळ
बरेच दिवस जायचं जायचं म्हणत ह्या महिन्यात अंबेजोगाईला जायचा योग आला. पुणे अंबेजोगाई प्रवासात नेहमीची वाट सोडून आडवाटेवरच ठिकाण म्हणून करमाळा बघायच ठरवल. पुण्याहून सोलापूर हायवेवर साधारण १०० किलोमीटर गेल्यावर भिगवणला फाटा लागतो तिथून ६० किलोमीटर वर करमाळा आहे. सोलापूर जिल्हातील एक तालुक्याचं ठिकाण असलेल करमाळा एक छोटस गाव आहे. सुरवातीच्या काळात बहामनी साम्राज्याचा भाग असलेले करमाळा नंतर नगरची निजामशाहिच्या अमलाखाली होते. निजामशाही सरदार रावरंभा निंबाळकरांची जहागीर असलेले करमाळा प्रसिद्ध आहे ते इथल्या कमला भवानी किंवा कमळजाइ मंदिरासाठी.
कमला भवानीच मंदिर गावाच्या बाहेरील ओसाड अश्या माळावर आहे. मंदिरच वैशिष्ट्य म्हणजे इथे चक्क दाक्षिणात्य शैलीशी मिळतीजुळती गोपुरे आपले मंदिर प्रांगणात स्वागत करतात. महाराष्ट्रातील खूप कमी मंदिरात अशी गोपुरे बघायला मिळतात. शैलीतील हा बदल खरतर पिढीतील बदलामुळे झालाय. मुख्य मंदिर बांधल (कदाचित जीर्णोद्धार केला) सरदार राजे रावरंभा ह्यांनी तर बाजूची तटबंदी आणि हि गोपुरे बांधली त्याच्या मुलानी म्हणजे राजे जनकोजीनि. जनकोजी दक्षिणेच्या स्वारीवर असताना तिकडची मंदिरे आणि भव्य गोपुरे पाहून प्रभावित झाला आणि त्यांनी तिकडचे कारागीर करमाळ्यात आणून सुंदर गोपूर बांधून घेतली.
मूळ मंदिर चारही बाजूनी भक्कम दगडी तटबंदीनी वेढलेले आहे. तटबंदीच्या आतील बाजूस सुंदर दगडी ओवऱ्या आहेत आणि पूर्ण अंगणाला दगडी फरसबंदी केली आहे. मंदिरा समोर होमकुंड आणि तीन गगनचुंबी दीपमाळा आहेत. मंदिराची शैली हेमाडपंथी आहे असा उल्लेख सगळीकडे असला तरी त्या शैलीची वैशिष्ट्ये ठळकपणे इथे पाहायला मिळत नाहीत जसे उंच जोते, मंदिराचा बाह्य आकार आणि त्यावरील नक्षीकाम इत्यादी ह्या मंदिरावर दिसत नाहीत. कदाचित हेमाडपंथी आणि इस्लामिक शैलीची सरमिसळ झाली असावी असे वाटते. दिपामालांचा प्रकार हि पारंपारिक मराठी नसून बराचसा इस्लामिक प्रभाव असलेला वाटतो. एक शक्यता अशी वाटते कि मुळ मंदिर हेमाडपंथी शैलीतील असावे आणि जीर्णोद्धार निजामशाही काळात झाला असल्याने हि शैलीतील सरमिसळ झाली असावी. अलीकडच्या काळातच सुंदर अशा दगडी मंदिराला ऑइल पेंट फासून त्याच्या सुंदरतेला दृष्ट लागणार नाही ह्याची काळजी देवस्थान trust नि घेतलेली दिसतीय.
मंदिराबद्दल आख्यायिका अशी सांगतात कि सरदार रावरंभा हा तुळजापूरच्या भवानी मातेचा निस्सीम भक्त होता वृद्धापकाळात त्याला तुळजापूरला दर्शनाला जाणे शक्य होईना म्हणून भवानीने त्याला दृष्टांत दिला कि मी तुझ्या मागे तुळजापुराहून करमाळ्याला येईन पण तू मागे वळून बघायचे नाही. रावरंभा गावाबाहेरील माळापर्यंत आला आणि त्याच्या मनात शंका आली. देवी खरच मागे येत आहे कि नाही हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले आणि देवी अंतर्धान पावली. त्याचठिकाणी हे मंदिर बांधले आहे. आता अशीच कथा मी मिरजेच्या अंबाबाई बद्दलहि ऐकली आहे, खरे खोटे ती भवानीच जाणे. कमला भवानी मातेची मूर्ती मात्र अतिसुंदर आहे.. काळ्याशार पाषाणातील हातात त्रिशूल आणि तलवार धारण केलेली अष्टभुजा मूर्ती डोळ्याचे पारणे फेडते. देवीच्या उजव्या डाव्या बाजूस शंकर व गणपतीची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या अगदी समोरच एक शंकराचे अगदी छोटेसे पण सुंदर दगडी घुमटी सारखे देऊळ आहे आणि त्याच्या शेजारी कुणाची तरी समाधी. समाधीचा वापर सध्या गावकरी पत्त्यांचा फड लावण्यासाठी करतात. मंदिर परिसराच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ९६ पायऱ्यांची विहीर.
कातीव दगडात बांधलेल्या ह्या अष्टकोनी विहिरीत पाणी जवळपास ५० ते ६० फुट खोलवर असेल. पण पाण्यासाठी त्या खोलीपर्यंत बांधलेल्या एकसारख्या सुरेख ९६ पायऱ्या आहेत. पुरातन काळापासून पाणी पुरवठ्यासाठी बांधलेल्या अशा विहिरी (step wells) भारतभर पाहायला मिळतात. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे हि अगदी दक्षिण उत्तर अक्ष ठेऊन बांधली आहे. उत्तरेकडून पायर्या आणि दक्षिणेला विहीर. ह्या अक्षाचा फायदा म्हणजे सुर्यभ्रमण पूर्वेकडून पश्चिमेकडे होत असल्यामुळे, पाणी आणि पायऱ्या दिवसभर जास्तीजास्त वेळ सावलीत राहतात फक्त भरदुपारी १२ वाजण्याच्या आसपास पाण्यावर सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि सावलीतील पायऱ्या वापरणेही सोयीचे होऊन जाते. भारतभर जवळपास सगळ्याच अशा विहिरी (step Wells) ह्याच संकल्पनेवर बनलेल्या दिसतात हे विशेष. आपल्या पूर्वजांचे वातावरणाला अनुकूल करून घेणारे design बघून थक्क व्हायला होते. अर्थातच आपण जशी अनेक पुरातन पाणवठा ची जशी वाट लावली आहे तशीच ह्या विहारीची देखील लावली आहे. पाणी उपसा नसल्यामुळे आणि कचरा टाकल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. जवळपास सगळीकडे गवत पसरले आहे आणि ह्या ऐतिहासिक ठेव्याशेजारीच ग्रामपंचायतीने महिलांसाठी असलेले पण बंद असणारे स्वच्छतागृह बांधले आहे.
इतक्या सुंदर मंदिर आणि परिसरात फिरल्यानंतर आम्ही निघालो अंबेजोगाई च्या दिशेने. रस्त्यातच आम्हाला मिळाला आणखी एक ऐतिहासिक ठेवा ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती.
कुर्डुवाडी एसटी आगारात पोहोचलो. तिथे ८.४५ची सोलापूर- नाशिक एसटी लागली होती. माझा कडे १५ मिनिट होते तोपर्यंत मी तिथेच नाश्ता करून घेतला. कुर्डुवाडी ते करमाळा अंतर ४७ किमी आहे. एसटी ने मला सव्वा तास लागला. बरोबर दहा वाजता करमाळा स्थानकात पोहचलो.
(जेऊर वरून हि करमाळा जाण्यासाठी तास ते दोन तासात एसटी आहे. त्याने हि जाऊ शकतात. माझा पहिला विचार जेऊरला उतरून एसटी ने करमाळ्याला जायायचा होता, कारण जेऊर ते करमाळा अंतर २१ किमी आहे. त्यामुळे मी लवकर पोहचलो असतो. पण मला गाड्याची माहिती नसल्यामुळे मी कुर्डुवाडी वरून जायचं ठरवलं. पण मी खाली करमाळा एसटी आगार मधील वेळापत्रकचा फोटो ठेवला. आहे त्यावरून तुम्हाला जेऊर ते करमाळा गाड्यांच वेळापत्रक कळेल.)

आहे.
कमलाभवानी माता मंदिर, ९६ पायऱ्यांची बारव
पुण्याहून सोलापूर हायवेवर साधारण १२५ कि.मी.वर भिगवणला करमाळा फाटा लागतो.
तिथून ६० कि.मी.वर करमाळा हे तालुक्याचं ठिकाण असलेल गाव आहे. या गावात
लोकांना फारसा माहीत नसणारा व दुर्लक्षित असा करमाळा भुईकोट आहे. सोलापूर,
नगर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने ऐतिहासिकदृष्टीने करमाळा
किल्ल्याला खूप महत्व होते. हैदराबादच्या निजामाचे सरदार रावरंभा निंबाळकर
यांच्याकडे असलेल्या जहागिरीत बीड, उस्मानाबाद, जामखेड, खर्डा, भूम, कर्जत,
करमाळा या प्रदेशांचा समावेश होता. करमाळा शहर म्हणजे रंभाजीराव निंबाळकर
यांच्या जहागिरीमधील मुख्य गाव होय. सूफी संत करमेमौला हे करमाळा येथे
वास्तव्य करून होते. या सूफी संताच्या करमेमौला या नावावरून या गावाला
करमाळा नाव पडले असे सांगितले जाते. रंभाजीराव उर्फ रावरंभा हे
तुळजापूरच्या तुळजा भवानीचे परमभक्त होते.
या आदिशक्तीचे एक भव्य मंदिर उभारण्याचे ठरवुन करमाळा गावाच्या पूर्वेस
रावरंभाराव व त्यांचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी इ.स. १७२७ -१७३०च्या
दरम्यान कमलाभवानी मंदिर व या मंदिराबरोबर करमाळा भुईकोट बांधला.
दक्षिणोत्तर असलेला अंडाकृती आकाराचा हा किल्ला १५ एकरवर पसरलेला असुन या
गडाच्या तटबंदीत गोलाकार एकोणीस व मुख्य दरवाजा शेजारी अष्टकोनी दोन असे
एकूण एकवीस बुरूज आहेत. किल्ल्याच्या बुरुजावर व तटावर विटांनी बांधलेल्या
सुंदर चर्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीने संपुर्ण गावाला आपल्या कवेत घेतले
आहे पण किल्ल्यात असलेल्या गावानेच या किल्ल्याचा घास घेतला असुन आत वाढत
असलेल्या वस्तीने किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे. किल्ल्याचे दगड घरांच्या
बांधकामासाठी वापरले गेले असुन गावाचा आकार वाढतच असल्यामुळे किल्ल्याचे
अवशेष अतिक्रमणात लुप्त होत चालले आहेत. किल्ल्याच्या तटबंदीची मोठया
प्रमाणात पडझड झाली असल्याने तटबंदीवरुन सलगपणे फिरता येत नाही व
तटबंदीच्या कडेने फेरी मारावी लागते. बाहेरून पाहताना किल्ल्याचे बुरुज जरी
भक्कम वाटत असले तरी आत मात्र तटबंदी आणि बुरुज पोखरलेले आहेत. किल्ला
नीटपणे पाहायचा झाल्यास स्थानिक लोक वेस म्हणुन ज्या भागाला ओळखतात तेथुन
किल्ला पहाण्यास सुरवात करावी. वेशीतील पूर्वेकडील दरवाजाने किल्ल्यात
शिरताना उजव्या हाताने थोडेसे पुढे गेल्यास एक दगडी बांधकामाची भिंतीत
नक्षीदार कोनाडे असलेली पुष्कर्णी दिसुन येते. हि पुष्कर्णी पाहून परत
आल्यावर किल्ल्याच्या बाहेरच्या तटबंदीत असलेल्या पुर्वाभिमुख दरवाजातून
आपला किल्ल्यात प्रवेश होतो. आत शिरल्यावर समोरच वेशीवरील मारुतीचे मंदिर
आहे. या मंदिराजवळ काही उध्वस्त प्राचीन मुर्त्या, भग्न वीरगळ आणि सतीच्या
दोन शिळा पहायला मिळतात. मारुती मंदिराच्या समोरच किल्ल्याचे दगडात
बांधलेले उत्तराभिमुख प्रवेशव्दार असून त्याच्या वरील बाजुस तोफेच्या
मारगिरीसाठी वीटांनी बांधलेले ३ झरोके आहेत. किल्ल्याचा लाकडी दरवाजा आणि
त्यावरील लोखण्डी खिळे आजही शिल्लक असुन प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूस
अष्टकोनी बुरुज आहेत. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या या भागाला अधिक
संरक्षण मिळावे यासाठी येथे मुख्य कोटाबाहेर परकोटाची रचना केलेली आहे. या
परकोटात उजव्या बाजूला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे (खोलेश्वर) मंदिर
पाहावयास मिळते. यातील ब्रम्हाच्या मंदिराचे मस्जिदमध्ये रुपांतर झालेले
असुन विष्णुमंदीर अलीकडील काळातील तर शिवमंदीर मध्ययुगीन आहे. या
परकोटाच्या बाहेरील बाजुस बांधीव खंदक असुन सध्या त्याचे रुपांतर
सांडपाण्याच्या नाल्यात झाले आहे. पुर्वी संपुर्ण किल्ल्यालाच खंदक असावा
पण काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. किल्ल्याच्या या बाजुचा बाहेरील रस्ता
खंदक रोड म्हणुन ओळखला जातो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस
दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे ध्वजस्तंभ असुन खुप मोठया प्रमाणात
झुडुपे वाढलेली आहे. या भागातुन किल्ल्यात वसलेले गाव पसरलेली तटबंदी आणि
बुरुज दिसतात. किल्ल्याचे बहुतेक अवशेष तटबंदी शेजारी असल्याने फक्त तटबंदी
वरून फेरफटका मारून देखील किल्ला पहाता आला असता पण अनेक ठिकाणी तटबंदी
ढासळलेली असल्याने ते शक्य होत नाही. दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला
चालत गेल्यावर एक मोठी बांधिव बारव आहे. या बारवमध्ये उतरण्यासाठी दोन
बाजूने पायऱ्या असुन काठावर कमानी असलेला छोटेखानी महाल आहे. उन्हाळ्यात
थंडावा मिळण्यासाठी पाण्याशेजारी जमिनीखाली हा महाल बांधला गेला असावा. या
महालातून जानोजीरावांच्या महालात जाण्यासाठी भुमिगत रस्ता असल्याचे
सांगितले जाते. सध्या या बारवचा उपयोग कचरा टाकण्यासाठी व गणेश
विसर्जनासाठी केला जातो.या बारवच्या उजव्या बाजुला तटबंदीलगत एक पिराची कबर
आहे. बारव पाहून रस्त्याने पुढे चालत गेल्यावर रावरंभा निंबाळकर यांनी
बांधलेला राजवाडा असून सध्या इथे कोर्टाची इमारत इतर सरकारी कार्यालय आहेत.
आयताकृती आकाराच्या या राजवाडयात मध्यभागी असलेल्या अंगणात एक विहिर आहे.
वाडयाच्या मागील बाजूस बाहेर जाण्यासाठी एक लहान दरवाजा आहे. इथुन पुढे
गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाच्या तटबंदीत असलेल्या दरवाजापाशी
पोहोचतो. याठिकाणी दुहेरी तटबंदी असुन बाहेरील तटबंदीत असणारा दरवाजा
पुर्णपणे नष्ट झाला आहे. दरवाजातून बाहेर पडून तटबंदीच्या कडेकडेने चालताना
आपल्याला खंदकात असलेली विहिर तसेच एक चोर दरवाजा दिसतो.किल्ल्यात असणारी
वस्ती आणि घाण यामुळे बाकीचे किल्ल्याचे अवशेष पाहाण्यासाठी तटबंदी व
बुरुजाच्या कडेकडेने फ़िरावे लागते. यातील बऱ्याच बुरुजांच्या आतील भागात
खोल्या असुन बुरुजावर जाण्यासाठी अंतर्गत जिने आहेत. किल्ला पूर्ण पाहायला
एक ते दीड तास पुरेसा आहे. करमाळा किल्ल्याव्यतिरिक्त गावात कमलाभवानी
मंदिर, बारव आणि समाध्या पाहाण्यासारख्या आहेत.
© Suresh Nimbalkar
एसटी आगारातून चालत ५ मिनिटावर किल्ला आहे. खरं बघितला तर पूर्ण गाव किल्ल्याचा तटबंदीच्या आत, बाहेर बसला आहे. त्यामुळे आपल्याला सगळे अवशेष शोधायला लागतात. किल्ल्याची तटबंदी आणि काही बुरुज ढासळायला लागले आहेत. ट्रेकक्षितीजच्या (trekshitiz) वेबसाईट वर दिल्याप्रमाणे मी मारुतीच मंदिर असलेल्या दरवाजा जवळ प्रथम गेलो. हाच मुख्य दरवाजा वाटतो. त्यातून आत गेल्यावर समोर मारुतीच मंदिर लागत आणि डावीकडे मंदिराच्या दरवाजा समोर अजून एक दरवाजा लागतो. मंदिराच्या आत अजून एक प्राचीन मूर्ती दिसते आणि बाहेर काही विरगळी आणि सतीशिळा दिसतात. तसेच मंदिराच्या समोर किंवा आतील किल्ल्याचा दरवाजाच्या तटबंदीला लागून, अजून एक छोट प्राचीन मंदिर आहे. आणि त्याचा बाजूला एक शंकराचा मंदिर आहे. त्या मंदिरात हि काही तुटलेल्या विरगळ आणि मूर्ती आहेत. मंदिरच्या गाभाऱ्यातील दगडी खांबावरून प्राचीन आहे असे कळते.
मंदिर बघून पुन्हा मुख्य दरवाजाच्या बाहेर येऊन डावीकडे किल्ल्याच्या तटबंदीला लागून पुष्कर्णी (पायऱ्यांची विहीर) लागते. ती बघून मी पाठी फिरून पुन्हा मुख्य दरवाजाने आत जाऊन. पुन्हा आतील दुसरा दरवाजा लागतो तिथून आत गेलो. ह्या दरवाजाच्या बुरुजावर चढता येते. त्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या मस्जिदच्या बाजूने बुरुजावर जाता येते. बुरुजावरून किल्ल्यातील थोडं गाव दिसते. पुन्हा खाली दरवाजा जवळ आल्यावर बाजूला असलेला महाल दिसतो. त्याचा विहिरीत आता पूर्ण कचरा टाकलेला आहे. हा महाल बघून पुन्हा दरवाजा जवळ आलो. तिथून एक रस्ता सरळ बुरुजाचा बाजूने जातो तर एक रस्ता उजवीकडे कडे जातो. उजवीकडील रस्त्याने गेलो असता आपण जुन्या कोर्ट जवळ पोहचतो. हा कोर्ट पहिला वाडा होता. तिथे आत एक विहीर आहे. अजून थोडं पुढे गेलो असता आपल्याला त्याचा दुसरा दरवाजा दिसतो. हा लाखडी दरवाजा कायमचा बंद केलेला दिसतो.
कोर्ट / वाडा बघून बाहेर आल्यावर पुन्हा पाठी न जाता पुढे गेलो असता. आपण गावातील गल्लीतून जाताना आपल्याला तटबंदी लागते. त्या तटबंदीला पुढे एक लहान दरवाजा लागतो. ह्या दरवाजातुन बाहेर गेलो असता आपल्याला बाहेरून तटबंदीचे बुरुज आणि खंदकचा खड्डा दिसतो. पुढे रस्ता न दिसल्यामुळे मी पुन्हा दरवाजने आत येऊन गल्लीतून पुढे चालत राहिलो. आणि विचारत विचारत बुरुजाचा बाजूने किल्ल्याचा बाहेर आलो. मुख्य रस्त्याला आल्यावर जर पुन्हा डावीकडे वळून रस्त्याने बुरुजाचा बाजूने गेलो असता, पुन्हा एक रस्ता महात्मा गांधी महाविद्यालयचा बाजूने आत जाताना दिसतो. ह्या रस्त्याने गेलो असता हा रस्ता आपल्याला मारुती मंदिर जवळील दरवाजा जवळ घेऊन जातो. आणि बाजूला आपल्याला बुरुज आणि तटबंदी दिसते.
किल्ल्यातून बाहेर पडून मी सात नाल्याची विहीर पाहायला गेलो. खरा तर मला खंदकातील विहीर बघायची ती किल्याच्या खंदका मध्येच होती. पण तिथे विचारलेल्या लोकांना कोणाला नीट माहित नव्हता. काही जणांनी मला सात नाल्याची विहीर म्हणून एक मोठी तळा एवढी विहीर आहे, तिथे पाठवलं. कोणी मला सांगितलं कि ह्यात सात विहीर आहेत. म्हणून ह्याला सात विहीर म्हणतात. पण पाणी एकदम सुखायला येते तेव्हा त्या विहिरी दिसतात. नाही तर एक मोठी विहीर दिसते. पण हि विहीर किल्ल्या पासून साधारण १ ते दीड किमी लांब RTO कार्यालय जवळ आहे. बाकी मला तरी ती विहीर ऐतिहासिक वाटली नाही. तसा कुठे फलक हि नाही दिसला. त्यामुळे माझा इथे अर्धातास वाया गेला असा मला वाटलं. त्यामुळे मला पुढे उशीर झाला. त्यामुळे हि विहीर न पहिली तरी हरकत नाही.
![]() |
| कुर्डुवाडी बस स्थानक वेळापत्रक खाली एका बाजूचा काढलेला फोटो त्यात परांडा आणि करमाळाचा वेळापत्रक पाहावे |
कमलाभवानी माता मंदिर, ९६ पायऱ्यांची बारव
तेथुन पुढे मी कमलाभवानी माता मंदिर बघायला गेलो. मंदिर गावातून २ किमी वर आहे. त्यामुळे खाजगी रिक्षा करून जायायला लागते किंवा एसटीने त्या मंदिराच्या फाट्याला उतरून ५ मिनटं लागतात. करमाळ्यावरून परांडा किंवा सालसचा दिशेने जाणाऱ्या एसटीने उतरावे. येथे लांबपल्याचा एसटी थांबत नाही.
मी मोठया विहिरी जवळून एका बाईकस्वार कडून मदत माघून एसटी स्टॅन्ड जवळ गेलो. तेथुन एसटीची वाट न पाहता ८०रुपये देऊन रिक्षा करून मंदिरात गेलो. सव्वा बाराला मी मंदिरात पोहचलो. मला साडे बाराची परांडा साठी एसटी पकडायची होती. पण मंदिर, ९६ पायऱ्यांची बारव आणि समाधी पाहेपर्यंत १ वाजला. हेच जर मी ती विहीर बघायला गेलो नसतो तर मला साडे बाराची परांडा एसटी भेटली असती.
मंदिराचा बाजूलाच बारव आणि समाधी आहेत. मंदिर किल्ल्या एवढेच प्राचीन आहे. असं म्हणतात किल्ल्या बांधायचा आधी मंदिर निर्माण केलं होता. मंदिर खूप सुंदर आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या सैराटचा गाण्याचा चित्रफीत मध्ये मंदिर आणि बारव दाखवली आहे.
करमाळ्याची कमलाभवानी देवी – मोघली सरदार राव रंभाजी निंबाळकर यांनी कुलस्वामिनी कमला भवानीचे एक मंदिर बांधलेले असून ते करमाळा शहराजवळील एका टेकडावर आहे, याला देवीचा माळा असे म्हणतात. मंदिराभोवती उंच कोट चढविला असून मंदिर समोर एक सभामंडप आहे. नवरात्रात इथे भक्तांची रीघ लागलेली असते. हाती त्रिशूळ आणि तलवार हाती घेतलेल्या अष्टभुज कमला मातेची मूर्ती प्रसन्न असून, देवीच्या मंदिरासमोर आकाशात झेपावणाऱ्या एखाद्या मनोऱ्यासारख्या तीन मोठ्या दीपमाळा बांधल्या आहेत.
तो.
उस्मानाबाद - सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर करमाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी अलिकडे म्हणजे 17 व्या शतकानंतर हैद्राबाद निजामाचा मराठी सरदार निंबाळकर यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेले आहे. हा भागसुध्दा दुष्काळी, पाऊस हा 500 मि.मी च्या आसपास पडणारा, तापमान 45 अंश सेंटिग्रेटपर्यंत जाणारे, शुष्क हवा, हलकी जमीन असलेला आणि सीना ह्या तुटीच्या खोऱ्यातला आहे. या ठिकाणचा राजा रावरंभा निंबाळकर त्याच्या काळात बांधण्यात आलेले कमलादेवीचे मंदीर आणि त्याच्या पुढील भागात 96 पायऱ्यांची बारव आज देखील पहाण्यास उपलब्ध आहे.
करमाळा गावास मात्र जुना इतिहास आहे असे स्पष्टपणे या ठिकाणच्या वास्तूंवरून दिसते. त्या गावामध्ये एक लहानसा भुईकोट किल्ला आहे. नेहमीप्रमाणे त्याच्या भोवती दोन खंदक आहेत. खंदकाच्या आत दोन यादव / चालुक्याच्या काळातील उत्कृष्ट देवळे आहेत. किल्ल्याला लागूनच एक बारव आहे. किल्ल्याच्या आत एक कारंजा बारव आहे. या किल्ल्याच्या अवतीभोवती जुने गाव आहे.
त्या ठिकाणच्या उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थेवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. किल्ल्याच्या पश्चिमेकडे एक मोठा तलाव आहे. त्या तलावाला लागूनच एक सात विहीरींची बारव आहे. या बारवेचा आकार 150 - 200 फूट व्यासाचा आहे. तिची खोली 70 - 80 फूट असावी. त्या विहीरीमध्ये परत सात विहीरी आहेत आणि पाणी हे जमिनीला काठोकाठ असे भरलेले असते. ही मोठ्या आकाराची प्रचंड विहीरी, विहीरखोदाईच्या शास्त्रातील आश्चर्य मानायला काही हरकत नाही. ती कढईच्या आकाराची आहे. ज्या लहानशा नाल्यावर हा तलाव बांधलेला आहे तोच नाला पुढे खंदकाला पाणी पुरवठा करतो. या सात विहीर नावाच्या मोठ्या विहीरीवरून करमाळा गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अलिकडे म्हणजे अगदी 1960 पर्यंत होत होता असे कळते. विहीरीपासून काढलेल्या एका नलिकेद्वारे पाणी पुरवठा केला जात असे. त्याला पुढे हौदाची मालिका जोडलेली आहे. ही व्यवस्था आजसुध्दा उध्वस्त झालेल्या अवस्थेत आपणास दिसते. दोन माणसाद्वारे किंवा रहाटाचा उपयोग करून या नलिकेला (पाईपलाईनला) सातत्याने पाणीपुरवठा केला जात होता असे सांगतात. अलिकडच्या काळात दूर अंतरावरून (सीना नदीतून) पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे ही सर्व जुनी ऐतिहासिक व्यवस्था आज वापरात नाही.
करमाळा
प्रकार : नगरकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
© Suresh Nimbalkar

.jpg)

.jpg)
.jpg)

No comments:
Post a Comment