बंग संस्कृतीतील दुर्गापूजा
बंग संस्कृतीतील दुर्गापूजा प्रसिद्ध आहे. भारतातील अन्य प्रदेशांत साजरे होणारे नवरात्र आणि दसरा यांना जोडूनच दुर्गोत्सव असतो. या उत्सवातील मुख्य देवता मोठ्या टपोऱ्या डोळ्यांची आणि गोबऱ्या गालांची, देखणी दुर्गा आहे; पण तिच्यासह लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय या देवतांचीही पूजा असते. (Bengal Culture Durga Puja) बंगाली आणि ओडिया परंपरांमध्ये या चार देवता दुर्गादेवीची मुले मानली जातात. आपल्या मुलांना घेऊन दुर्गा आपल्या माहेरघरी येते, असे मानले जाते. त्यामुळे बंगाली लोकगीतांमध्ये ‘आगमनी गान’ नावाची विशेष प्रकारची गाणी आढळतात. दुर्गेच्या येण्याचे कौतुक या गीतांमध्ये असते.
शरद ऋतूत येणाऱ्या दुर्गेचे स्वागत करताना एखादा लोकगीतकार म्हणतो, ‘शारद प्रभाते आलोर बीना, बाजलो रे ओयि बाजलो रे, महामायेर आगोमोने, शाजलो भुबन शाजलो रे’ म्हणजे, ‘शरदाच्या पहाटवेळी, प्रकाश किरणांच्या तारा छेडल्या गेल्या आहेत. महामायेच्या स्वागतासाठी पूर्ण भुवन सजलेले आहे.’ (Bengal Culture Durga Puja)
Navratri 2023 : जगतजननीचा जागर
ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील १२९ वे सुक्त हे ‘नासदीय सुक्त’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये सृष्टीच्या निर्मितीच्या आधीची स्थिती वर्णन केलेली आहे, तसेच हे ब्रह्मांड का व कसे अस्तित्वात आले, याविषयीचे कुतूहल किंवा जिज्ञासाही व्यक्त केलेली आहे. वेदांतामध्ये म्हणजेच उपनिषदांमध्ये सृष्टीचे हे गूढ उकलले आहे. सर्व नाम-रूपांच्या आधीचे जे मूळ व एकमेवाद्वितीय श्रेष्ठ तत्त्व आहे, त्याला उपनिषदांमध्ये ‘ब्रह्म’ अशी संज्ञा दिलेली आहे. (Navratri 2023) हे ब्रह्म शाश्वत, ज्ञानमय, अनंत, नाम-रूपरहित असे परमचैतन्य आहे. छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे की, या परब्रह्माने ‘एकोऽहम बहुस्याम’ (मी एक आहे, आता बहु व्हावे) असे ईक्षण केले व त्या एकामधूनच विविध नाम रूपांची ही निर्मिती झाली. अर्थात, ही निर्मिती आपण ‘बहु’ व्हावे या संकल्पातूनच जी माया प्रकटली होती तिनेच मूळ ब्रह्म रूपापासून, त्याचेच निमित्त व उपादान कारण बनवून केली. याचा अर्थ ही जी साकार सृष्टी आपण पाहतो, ती या जगदंबेचीच नवरात्रौत्सव निर्मिती आहे. सर्व व्यवहार, चलनवलन हे मायेमुळेच घडते. निराकारातून साकार अरुपातून रूप, निर्गुणातून सगुण निर्माण करणारी ही जगदंबा आहे. त्यामुळेच या आदिमायेला ‘जगत्जननी’ असे म्हटले जाते. सर्व देवीरूपे, शक्तीरूपे ही त्या एकाच जगदंबेची रूपे मानली जातात. नवरात्रीमध्ये याच आदिमायेची, आदिमातेची उपासना केली जाते, तिचा जागर केला जातो. (Navratri 2023)
तात्त्विकदृष्ट्या या मायेचे अनेक प्रकारचे वर्णन पाहायला मिळते. मुळात ही माया कशी आहे, याचे वर्णन सर्वसाधारणपणे ‘अनिर्वचनीय’ नावाच्या ख्यातीने केले जाते. ‘अनिर्वचनीय’ म्हणजे ‘सत् व असत् यापेक्षा विलक्षण’ किंवा ‘जिचे नेमकेपणाने वर्णन करता येत नाही अशी’. अर्थात, हा जगत्रूपी संसार भासत असला तरी ब्रह्मज्ञान झाल्यावर तो मिथ्या आहे, याची जाणीव होते. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ असे आद्य शंकराचार्यांनी म्हटले होते. शंकराचार्यांचे आजेगुरू गौडपादाचार्य यांनी तर जगताची उत्पत्तीच न मानणारा ‘अजातवाद’ सांगितला आहे. अर्थातच हे जगत अशाश्वत, क्षणभंगुर आणि सतत परिवर्तनीय आहे. गीतेतही या जगताला ‘दुःखालयम् अशाश्वतम्’ असे म्हटले आहे.
सांख्य तत्त्वज्ञानात ‘प्रकृती आणि पुरुष’ अशा संज्ञा आहेत. ही प्रकृती विविध तत्त्वांनी बनलेली असते व ती जड आहे. चिनी तत्त्वज्ञानातही याच अर्थी ‘यिन व यांग’ अशा संज्ञा आहेत. गीतेत अष्टधा प्रकृतीचे वर्णन असून, त्यामध्ये पंचमहाभूते, मन, बुद्धी व अहंकार यांचा समावेश होतो. अर्थात, प्रकृती जड असली तरी तिची अधिष्ठात्री देवता ही सगुण ब्रह्मच आहे. तेच देवीरूप, ब्रह्मशक्ती आहे. ब्रह्म आणि ब्रह्मशक्ती ही वेगळी नसून एकच आहे, हे आदिशंकराचार्यांनाही भगवतीने वाराणसीमध्ये एका प्रसंगातून दाखवून दिले होते. या जगदंबेचे केन उपनिषदात ‘उमा हैमवती’ रूपात वर्णन आहे. हिमालयाची कन्या पार्वतीचे किंवा सोन्याच्या अलंकाराने नटलेल्या देवीच्या रूपातील हे वर्णन आहे, जी इंद्रादी देवतांनाही ब्रह्मस्वरूपाचे रहस्य उलगडून दाखवते.
सर्वसाधारणपणे देवीचे भक्त हे देवी भागवत पुराणातून देवीचे स्वरूप समजून घेत असतात. या पुराणावर भागवत महापुराणाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. भागवताप्रमाणेच यामध्येही बारा स्कंध आहेत. भागवत पुराणातही नंद-यशोदेची कन्या व श्रीकृष्णाची बहीण म्हणून विशेष अवतरलेल्या तसेच कंसाच्या हातातून निसटून अष्टभुजेच्या रूपात प्रकट झालेल्या देवीचे वर्णन आहे. देवी भागवतात महिषासुर, चंड-मुंड, रक्तबीज, शुंभ-निशुंभ यांसारख्या आसुरांचा वध करणाऱ्या भगवतीच्या कथा आहेत.
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा, चंडिका, अंबिका, शाकंभरी अशी विविध नामे देवीने धारण केलेली आहेत. दश महाविद्यांमध्ये काली, तारा, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला यांचा समावेश होतो. पिंडी ते ब्रह्मांडी अशा सर्व ठिकाणी जी शक्ती आहे, ती प्रत्येकाच्या शरीरात कुंडलिनी स्वरूपात असते, असे मानले जाते. दक्ष प्रजापतीची कन्या व शिवपत्नी सतीने देहत्याग केल्यावर विष्णुचक्राने तिच्या देहाचे तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर जिथे जिथे पडले, तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. कालांतराने हीच सती हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपाने पुन्हा जन्मली व तिने पुन्हा शिवालाच वरले. महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका व वणीची सप्तश्रृंगी देवी ही शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या जगत्जननीला, मातृरूपाला त्रिवार वंदन!
महती नवदुर्गांची : श्री एकवीरा (श्री एकांबिका)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.
रविवार पेठेतील आझाद चौकात दत्त भिक्षालिंग स्थानाजवळ (कॉमर्स कॉलेज) नवदुर्गांतील प्रथम दुर्गा श्री एकवीरा तथा श्री एकांबिका देवीचे मंदिर आहे. शक्तिप्रधान, श्रीदुर्गेचे पालक स्वरूप, सर्वेच्छा पूर्ण करणारी व सर्व शक्तिगणातील प्रधान देवता असे श्री एकवीरा तथा श्री एकांबिका देवीला महत्त्व आहे. मार्कंडेय पुराणात ‘एकांकिका’ ही शक्तिप्रधान देवता आहे. या दुर्गेचे स्वरूप पालकत्त्वाचे आहे. मनोरथ पूर्ण करणारी, शक्ती गणांतील ही देवता प्रधान देवता म्हणून सुप्रसिद्ध आहे. `रेणुका, यल्लमा, रामजननी’ अशा विविध नावांनी ही देवता लोकाभिमुख आहे. जमदग्नी ऋषींची पत्नी व भगवान परशुरामांची माता, महाशक्तिपीठांतील माहूरगडची देवता म्हणूनही देशभर प्रसिद्ध आहे.
देवीच्या मुखवट्याची पूजा होते. अनेकांची कूळदेवता असून ती निर्गुण रूपात आढळते. या देवतेला यमाई देवी म्हणूनही संबोधतात. अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा यांनी या मंदिराला भेट दिल्याचे प्राचीन संदर्भ आढळतात. स्वयंभू अशी ही तांदळा (शिळा) असून एक हात उंचीची असून त्यावर रौप्य धातू मुखवटा बसवला आहे. भैरव आणि जोतिबा या परिवार देवता म्हणून ओळखल्या जातात. या मंदिरात वेताच्या बुट्ट्या (परडी) मध्ये देवीच्या मुखवट्याची पूजा होते. मिठा-पिठाचा जोगवा घालण्याची प्रथा अनेकांची कुळदेवता असून ती निर्गुण आहे.
महती नवदुर्गांची : श्री लक्ष्मीदेवी
नवदुर्गांतील नवमदुर्गादेवी म्हणजेच श्री लक्ष्मीदेवी होय. हत्तीमहाल, शाहू क्लॉथ मार्केट समोरील शासनाच्या वजनमापे कार्यालय परिसरात देवीचे मंदिर आहे. चतुर्भुज, शेंदूर महती लावलेली दोन फूट उंचीची बैठी मूर्ती मंदिरात लक्षवेधी आहे. मंदिराजवळील श्रीपादुका व महादेव देवीच्या परिवार देवता आहेत.
सर्व ऐहिक, पारलौकिक संपत्तीचे निर्भेळ सारगर्भस्वरूप, अखिल संपदा म्हणजेच ‘श्री’ व त्या गुणांची प्रेरणाशक्ती, त्या तत्त्वाचे दर्शन करविणारी जी मायाशक्ती तीच ‘लक्ष्मी’ या दोहोंचे अभिन्न, अखंड स्वरूप म्हणजेच ही देवी होय. जसे अर्धनारीनटेश्वर ही शिव-शक्तीची अखंडता आहे, तशीच ही देवता विष्णू शक्तीची अखंडता आहे. अशा दुर्मीळ तत्त्वाचे पूजन हे सर्वसुखभोग देणारे व मुक्ती देणारे आहे. येथे मूलतत्त्व शक्तीतच समाविष्ट आहे. त्यामुळे फक्त देवीस्वरूप दर्शनास मिळते. (संदर्भ : श्री नवदुर्गायात्रा मार्गदर्शन)
महती नवदुर्गांची : श्री अनुगामिनीदेवी (श्री अनुगांबिका)
नवदुर्गांतील सप्तदुर्गा देवी म्हणजेच श्री अनुगामिनीदेवी (श्री अनुगांबिका) होय. रंकाळा टॉवर परिसरातील राजर्षी शाहूकालीन धुण्याच्या चावीजवळील शेतवडीत देवीचे मंदिर आहे. सहा हातांची, पायाखाली राक्षस असलेली ५ फुटांची भव्य मूर्ती मंदिरात आहे. म्हसोबा, श्रीपादुका, महादेव आदी परिवार देवता आहेत.
अनुगामिनीदेवी कोल्हापूरची रक्षक देवता आहे. क्षेत्राचे संकटापासून ती रक्षण करते. करवीरवासी योद्ध्याच्या मृत्यूनंतर त्याला यमाची पीडा होऊ नये म्हणून त्या मृतात्म्याच्या मागून जाते व जगदंबेच्या पायी मुक्ती देते. संजीवनी नदी व मयुरी नद्यांच्या दिव्य संगमावरील रमणीय व प्रासादिक स्थानावरील ही देवता आहे. संजीवनी व मयुरी नद्यांचे स्मरण करून यथाविधी देवीचे दर्शन घेऊन आरती – स्तोत्र म्हणून परिवाराचे दर्शन घ्यावे, असे यात्रेचे स्वरूप आहे. (संदर्भ : श्री नवदुर्गायात्रा मार्गदर्शन)
नवरात्रौत्सव २०२३ : मातेच्या नात्याने जोडलेली पार्वती
देवी उपनिषदानुसार दुर्गा म्हणजे ब्रह्मस्वरूपिणी, आनंद आणि विज्ञानाचे रूप आहे. भारताच्या विविध प्रदेशांमध्ये देवीची विविध नावे आणि मूर्ती आढळतात. त्यातील नऊ शक्तींचा संक्षेपात परिचय देत आहोत. ही सारी पार्वतीची रूपे आहेत.
महाभारतात सगळ्यात प्रथम दुर्गेचे वर्णन आणि स्तोत्र आढळते. महाभारतकाळात दुर्गा म्हणजे शक्तीचे प्रतीक म्हणून समाजात स्थिरावलेली देवता असल्याचे कळते. दुर्गासप्तशतीमध्ये म्हटले आहे की, ही दुर्गा मनुष्यांसह सर्व प्राणिमात्रांना आपल्या कवेत घेते. माणूस बुद्धिमान असतो. परंतु प्राणी-पक्ष्यांनाही बुद्धिमत्ता असते. निसर्गातील प्रत्येक घटकासह या पार्वतीला मातेच्या नात्याने जोडले गेले आहे. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीचा आदर करणे, मांगल्य राखणे, ही पार्वतीची उपासना आहे.
छायाचित्र : पार्वती. इंडियन म्युझियम, कोलकाता. छायाचित्र अधिकार : डॉ. निवेदिता पांडे.
महती नवदुर्गांची : श्री कमलजादेवी (श्री कमलांबिका)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.
नवदुर्गातील पंचमदुर्गा देवी म्हणजेच श्री कमलजादेवी (श्री कमलांबिका) होय. शिवाजी पेठेतील म. गांधी मैदानाच्या पिछाडीस असणाऱ्या बावडेकर आखाड्याजवळील नृसिंह मंदिराजवळ कमलजादेवीचे मंदिर आहे मंदिरात कमळावर बसलेली चतुर्भुज, दोन फूट उंचीची नवदुर्गा महती प्रासादिक मूर्ती आहे. श्रीनृसिंह, विठ्ठल-रुक्मिणीदेव परिवार देवता आहेत.
भीमाशंकर क्षेत्रावर म हादेवांनी दुर्गासुराशी युद्ध सुरू केले. तेव्हा आपल्या योगिनीगणासह म हागौरी सिंहावर बसून युद्धास आली. तिने दुर्गासुराचा नाश केला म्हणून ब्रह्मदेवाने देवीची कमलपुष्पाने केव्हापासून ही गौरी ‘कमलजी’ नावाने प्रसिद्ध झाली.
गोव्यातील नवरात्रोत्सव | सलग २४ तास भजन करण्याची परंपरा

नवरात्री उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. देशात सर्वत्र हा उत्सव विविध प्रकारे साजरा केला जातो. पश्चिम बंगालची दूर्गापूजा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत होणारी पूजाही विशेष प्रसिद्ध आहे. गोव्यातील दूर्गापूजेची खास असे वैशिष्ट्य आहे. गोव्यातील दूर्गापूजेचा आढावा घेणारा हा लेख.
पणजी : गोव्यात दोन पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा होतो. राज्यात जी अनेक विषेशत: देवींची मंदिरे आहेत, त्या मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव (Navratri Festival in Goa) साजरा होतो. दुसरीकडे गेल्या काही वर्षांमध्ये विविध ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त सभामंडप उभारून तेथे नवदुर्गेच्या मूर्तींची पूजा होते. अशाप्रकारे नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा होतो. यानंतर नवव्या दिवशी मूर्तीचे विसर्जन होते. आणि मंडप काढला जातो.
गोव्यात श्री शांतादुर्गाची सर्वात जास्त मंदिरे आहेत. फातर्फा व कवळे येथील शांतादुर्गा प्रसिद्ध आहेत. तसेच येथे श्री सातेरी व केळबाय आणि श्री नवदुर्गेचीही मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत. बोरीची नवदुर्गा प्रसिद्ध आहे. श्री लईराईचे शिरगाव येथे प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच पणजी व बांदिवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिरे प्रसिद्ध आहेत. या सर्वच देवस्थानात मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा होतो. त्याचबरोबर श्री महालसा (Navratri Festival in Goa) व इतर मंदिरातही नवरात्रोत्सव साजरा होतो.
इतर देवतांच्या मंदिरांमध्येही पारंपरिक पद्धतीने प्रत्येक गावागावात नवरात्र उत्सव साजरा होतो. त्यानिमित्त बहुतांश ठिकाणी दररोज पूजा, भजन, कीर्तन सादर होते. पहिल्या दिवशी घटस्थापना झाल्यानंतर अनेक मंदिराच्या आतील भागामध्ये विविध प्रकारचे धान्य रुजण्यासाठी घातले जाते. नवव्या दिवशी ते काढून सोने म्हणून वाटले जाते. या नऊ दिवसांमध्ये गावातील त्या त्या मंदिरामध्ये स्थानिक कलाकार भजन सादर करतातच, त्याचबरोबर नऊ दिवसांतील एक किंवा दोन दिवस हरिनाम सप्ताह किंवा भजन सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्या सप्ताहामध्ये उभे राहून सलगपणे २४ तास भजन करण्याची परंपरा अनेक गावांमध्ये आहे. कीर्तनाचे कार्यक्रम ,भक्ती गीताचे कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर होतात. नाटके, ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, दांडिया आदींचे आयोजन ही केले जाते.
गावातील क्वचितच मंदिरामध्ये नवदुर्गा देवीच्या मातीच्या मूर्तीचे पूजन होते. त्या मंदिरामध्ये ज्या देवीची मूर्ती आहे, तिलाच नवदुर्गेच्या रूपामध्ये पूजले जाते. नऊ दिवस वेगवेगळी वेशभूषा त्या मूर्तीला केली जाते. फक्त देवीच्याच नव्हे तर मंगेश, रवळनाथ, गणेश आदी देवतांच्या मंदिरात सुद्धा नवरात्रोत्सवाचे आयोजन होते.
सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच विशेषत: शहरी भागामध्ये नवदुर्गा मंडळे स्थापन करून, मोठ्या मंडपात नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते. या मंडपात मातीच्या नवदुर्गा देवी मूर्ती बसवली जाते. पहिल्या दिवशी नवदुर्गा देवीच्या मूर्तीचे पूजन होते आणि मग पूजा-अर्चा भजन-कीर्तनाचे कार्यक्रम दररोज सादर केले जातात. काही ठिकाणी ऑर्केस्र्टा तसेच नाटकांचेही आयोजन केले जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये गोव्यामध्ये दांडिया अर्थात गरबा नृत्य स्पर्धांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे या दांडिया नृत्य पथकांची संख्या फारच घटली आहे. त्यापूर्वी गावागावातील कुठल्या ना कुठल्या मंदिरांमध्ये दररोज दांडिया नृत्य स्पर्धेचे आयोजन होत होते. त्या स्पर्धा पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत चालत होत्या. त्यामुळे गावागावातील अनेक तरुण तरुणींनी आपापली गरबा दांडिया नृत्य पथके स्थापन केली होती. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दांडिया नृत्य कलाकारही तयार झाले होते.
कामानिमित्त किंवा व्यवसाय करण्यासाठी गोव्यात येऊन त्यानंतर येथे स्थायिक झालेल्या बंगाली समाज, गुजराती समाज आदी विविध राज्यातील नागरिकांतर्फे वेगवेगळ्या पद्धतीने विविध ठिकाणी नवरात्र उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये त्या त्या राज्यातील नागरिक एकत्र येऊन विविध कार्यक्रम सादर करतात अशाप्रकारे गोव्यात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
कवळे-फोंडा येथील श्री शांतादुर्गा देवस्थान
पणजी
गोव्यात दक्षिण गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यात अनेक धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. त्यातील एक म्हणजे कवळे या गावातील श्री शांतादुर्गा देवस्थान. (Shantadurga Temple ) गेली अनेक दशके हे धार्मिक स्थळ देशातील विविध भागांतून विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर भारतीय राज्यांमधून गोव्यात येणार्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. (Shantadurga Temple )
बेळगाव किंवा महाराष्ट्रातून गोव्यात आल्यावर फोंडा भागात प्रवेश करून नंतर नागेशी किंवा फर्मागुडी या मार्गे कवळे येथे येऊन शांतादुर्गा देवस्थानात प्रवेश करता येतो. इथे देशी किंवा विदेशी पर्यटकांसाठी राहण्याची सोय नाही, त्यामुळे त्यांनी फोंडा शहरात खासगी स्वरूपात एखाद्या हॉटेलवर राहण्याची करणे चांगले असते. गोव्याबहेरून शेजारील राज्यातून येणार्या महाजनांना मात्र मंदिराच्या आवारात राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक तसेच केरळ या राज्यातून सारस्वत आणि ब्राह्मण समाजातील महाजन रूद्रभिषेक, रूद्र, लघु रूद्र किंवा महारुद्र अशा पूजा अर्चना, किंवा इतर धार्मिक विधी आणि कार्यासाठी देवस्थानात येतात, त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. देवस्थान आवारात चहा, नाश्ता आणि भोजनाची सोय असलेले शुद्ध शाकाहारी शांतादुर्गा कॅन्टीन आहे, ज्यामुळे जेवणाची सोय होऊ शकते.
कुठून कुठे किती किलोमीटर आहे?
कवळे येथील शांतादुर्गा देवस्थान ते मुंबईपासून हे अंतर ५८३.८ किलोमीटर एवढे आहे. एखाद्या वाहनाने त्यासाठी ११ तास ४८ मिनिटे लागतात तर रेल्वे प्रवासात १२ तास १३ मिनिटे कालावधी लागतो. देवस्थान ते पुणे हे अंतर ४४०.७ किलोमीटर एवढे आहे. गाडीने ९ तास तर रेल्वेने यायचे झाल्यास १३ तास लागतात. देवस्थान ते संभाजीनगर हे अंतर ७३३ किलोमीटर एवढे आहे. गाडीने १३ तास तर रेल्वेने १६ तासांचा कालावधी लागतो.
देवस्थानातील मोठे उत्सव
श्री शांतादुर्गा देवस्थानात होणारे मोठे उत्सव म्हणजे नवरात्र आणि फेब्रुवारी महिन्यात होणारी जत्रा. येत्या वर्षी हा जत्रोत्सव १२ ते १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. या आवारात शांतादुर्गा देवीचे मुख्य देवस्थान, गणपती देवाचे उपदेवस्थान आणि देवस्थान कमिटीचे कार्यालय असून कार्यालयाच्या शेजारी साड्यांचे दुकान आहे जेथे पर्यटक म्हणून किंवा देव दर्शन वा धार्मिक विधीसाठी आलेल्या महिला आणि क्वचित प्रसंगी पुरुषही खरेदी करताना दिसतात. देवस्थान आवारात पारंपरिक रथ आणि इतर काही साहित्य आणि जुनी बांधकामे पाहायला मिळतात.
दरदिवशी ३०० ते ४०० पर्यटक
या ठिकाणी दर दिवशी सर्वसाधारणपणे ३०० ते ४०० पर्यटक भेट देतात. ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय राज्यांच्या नागरिकांचा सहभाग असतो. देशी पर्यटक आणि भाविकांची इथे गर्दी पाहायला मिळते. पूर्वी विदेशी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत होते. आताही विदेशी पर्यटक येत असेल तरीही कोरोना कालावधीनंतर विदेशी पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या गोवा दौर्यादरम्यान, श्री शांतादुर्गा देवस्थानाला भेट दिली होती, हे विशेष. असे हे शांतादुर्गा देवस्थान देशी-विदेशी पर्यटक आणि भाविकांचे श्रद्धास्थान असून एक आकर्षक असे धार्मिक पर्यटनस्थळ आहे.
भारताबाहेरही आहेत देवीची शक्तिपीठे
असे मानले जाते की जगाच्या पाठीवर देवीची ५१ शक्तिपीठे आहेत. दक्ष प्रजापतीच्या यज्ञात भगवान शिवशंकराचा अपमान झाल्याने शिवपत्नी व दक्षाची कन्या सतीने प्राणत्याग केले. (famous shakti peeth in the world) त्यानंतर या यज्ञाचा विध्वंस झाला आणि सतीचे शव खांद्यावर घेऊन शिवाने तांडव सुरू केले. त्यावेळी शिवाचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र सोडून सतीच्या देहाचे तुकडे केले. हे तुकडे पृथ्वीवर विविध ठिकाणी पडले व देवीची शक्तिपीठे निर्माण झाली. कालांतराने हीच सठी हिमालयाची कन्या पार्वती रूपाने जन्मली व तिने पुन्हा शंकराशीच विवाह केला. (famous shakti peeth in the world)
भारतातील अनेक शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. मात्र, फाळणीनंतर वेगळ्या झालेल्या पाकिस्तान व बांगलादेशातही अनेक शक्तिपीठे आहेत. अगदी श्रीलंकेतही शक्तिपीठ पाहायला मिळते. भारताबाहेर सर्वाधिक शक्तिपीठे बांगलादेशात आहेत. बंगालची भूमी ही प्राचीन काळापासूनच देवीभक्तांची, शक्तिपूजकांची राहिलेली आहे. बांगलादेशातील शक्तिपीठांमध्ये सुगंधादेवी शक्तिपीठ (शिकारपूर), चट्टल भवानी शक्तिपीठ (चिट्टागांग), यशोरश्वेरी शक्तिपीठ (ईश्वरीपूर) आणि करतोयाघाट शक्तिपीठ (भवानीपूर) यांचा समावेश होतो.
बांगलादेशची राजधानी ढाका येथील ‘ढाकेश्वरी देवीचे मंदिरही प्राचीन काळापासूनच प्रसिद्ध आहे. या मंदिराला तिथे राष्ट्रीय मंदिरा’चा दर्जा आहे.
नेपाळमध्ये दोन शक्तिपीठे आहेत. त्यामध्ये मुक्तिधाम मंदिर (पोखरा) आणि गुहेश्वरी शक्तिपीठ (काठमांडू) यांचा समावेश आहे. श्रीलंका आणि तिबेटमध्ये प्रत्येकी एक शक्तिपीठ आहे. श्रीलंकेच्या त्रिकोणमाली येथे इंद्राक्षी शक्तिपीठ व तिबेटमध्ये मानस शक्तिपीठ आहे. पाकिस्तानात जगप्रसिद्ध हिंगलाज देवीचे शक्तिपीठ आहे. हिंगोल नदीजवळ चंद्रकूप पर्वतावरील गुहेत हे शक्तिपीठ आहे. याठिकाणी माता सतीचे शौर मळून पडले होते असे मानले जाते.
गोव्यातील जागृत देवस्थान श्री शांतादुर्गा कुंकळकरीण
मडगाव
गोव्यात कित्येक प्रसिद्ध देवस्थाने आहेत. ज्यांची ख्याती देशविदेशापर्यत पसरलेली आहे. अशा प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक आहे सासष्टी तालुक्याच्या कुंकळ्ळी गावाची जागृत देवी श्री शांतादुर्गा कुंकळकरीण आणि तिला लागून असलेल्या केपे तालुक्याच्या फातर्पा गावातील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण.
या दोन्ही देवस्थानांची स्वतःची अशी वेगळी खासियत आहे. नवसाला पावणार्या देवी म्हणून त्यांना ओळ्खले जाते. म्हणून जत्रा असो किंवा छत्रोत्सव भाविकांची अलोट गर्दी होते. अगदी महाराष्ट्राच्या संभाजीनगर वरून साडेबारा तासांचा प्रवास करून भाविक कुंकळ्ळी आणि फातर्पा येथे येतात.

या दोन्ही देवस्थानांचे स्वतःचे असे वेगळे वैशिष्ट्य आहे. श्री शांतादुर्गा हे जरी त्यांचे समान नाव असले तरीही त्यांचा इतिहास मात्र वेगळा आहे. श्री शांतादुर्गा कुंकळीकरीण देवीचे कुंकळ्ळीतील कुलवाडा गावाच्या तळेभाट येथे मुख्य मंदिर होते. तिला चार बहिणी आहेत. गोव्यात ज्यावेळी पोर्तुगीजांनी बाटवाबाटवी सुरू केली त्यावेळी देवी फातर्पा येथे जाऊन राहिली. समस्त कुंकळ्ळीच्या नागरिकांची श्री शांतादुर्गा देवी आराध्य दैवत आहेच.
विशेष म्हणजे सासष्टीतील ख्रिस्ती बांधवही शांतादुर्गा देवीला नवसाची देवी म्हणून मानतात. प्रत्येक वर्षी पौष शुद्ध नवमीच्या महिन्यांत पाच दिवस देवीची अखंड जत्रा भरते. गोव्यातील सर्वांत मोठा जत्रोत्सव म्हणून त्याची ख्याती आहे. कुंकळीकरिणीची आख्यायिका अशीही आहे की, देवी दरवर्षी आपल्या कुळवाडा या मूळ गावी येते म्हणून कुंकळीकर तो आनंद साजरा करण्यासाठी छत्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीला गुलाल लावला जातो आणि पालखी सजवली जाते. देवी आपल्या गावी येते म्हणून ती फार आनंदात असते. म्हणून पालखीचे वजन फार कमी असते पण जेव्हा देवीची पालखी पुन्हा कुंकळ्ळीत जाते त्यावेळी पालखी फार भारी होते. गोव्यात सर्वात प्रभावी देवी म्हणून अशी श्री कुंकळीकरीण देवीची ओळख आहे.

आख्यायिका –
श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवीचेसुद्धा वेगळे महात्म्य आहे. एका आख्यायिकेप्रमाणे शिव आणि विष्णू यांचे एकदा युद्ध झाले. हे युद्ध थांबत नसल्याचे पाहून ब्रम्हदेवाने श्री देवी दुर्गा हिला बोलावणे पाठवले. ते निमंत्रण मान्य करून श्री देवी दुर्गाने दोघांमधील युद्ध शांत केले. म्हणून तिला श्री शांतादुर्गा असे नाव पडले. कुंकळ्ळीत धर्मांतरण होत होते. म्हणून लोकांनी देवीचे देऊळ फातर्पा येथे आणले.
कसे जाल?
या दोन्ही मंदिरांना भेट द्यायची असल्यास सर्वांत प्रथम दक्षिण गोव्याचा मध्यभाग म्हणून ओळखल्या जाणार्या मडगाव येथे यावे लागते. मडगाववरुन सोळा किलोमीटर अंतरावर ही प्रसिद्ध मंदिरे वसलेली आहेत. मडगाववरुन बाळ्ळी आणि तेथून देवस्थान असा हा रस्ता आहे. स्वतःचे वाहन असल्यास पर्यटक चिंचोणे आणि बेतुलमार्गे काब दि राम किल्ला पाहून मंदिराकडे पोहोचू शकतात. देवस्थानापर्यंत प्रवासी बसेससुद्धा जातात.
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी देवी
शिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान देवीला आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक येतात. दरवर्षी नवरात्रोत्सवात गडावर मोठी यात्रा भरते. जाणून घेऊया सप्तशृंगी माता व गडाविषयी… (Saptashrungi Devi Vani)
भगवतीचे स्वरूप व स्थळाचे धार्मिक महत्व…
श्री सप्तशृंगी (भगवती) हे आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे. एकूण १८ हातात विविध अस्त्र धारण केलेली भगवती ही महालक्ष्मी, महासरस्वती व महाकालीचे त्रिगुणात्मक स्वरूप असून देवीचा आकार ११ फुट उंच व ९ फुट रुंद असून पूर्वमुखी व डाव्या बाजूला जराशी झुकलेली मान स्वरूपातील अतिसुंदर व विशाल मूर्ती आहे. सप्तचिरंजीवी ऋषी महर्षी मार्केंड ऋषींनी लिहिलेल्या दुर्गासप्तशतीचे श्रवण करत असतांना भगवती या शिखरावर ध्यानरूपी विराजमान झाली. सह्याद्रीच्या सात विविध शिखरांच्या (श्रुंग) परिसरात विराजमान झालेली देवी म्हणून भगवतीच्या या स्वरूपाला सप्तशृंग निवासिनी देवी असे संबोधले गेले आहे. (Saptashrungi Devi Vani)
प्रभू रामचंद्र दंडकारण्यातील प्रवासा दरम्यान भगवतीचा कृपाशीर्वाद घेवून पुढील प्रवासात मार्गक्रमन केल्याचे संदर्भ रामायणात आहेत. संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर यांची माता सप्तशृंगी ही कुलस्वामिनी आहे. (संदर्भ: ज्ञानेश्वरी ग्रंथातील १८ वा अध्याय) नवनाथ संप्रदायातील सर्व नाथांची ही ध्यान भूमी असल्याचे अध्यात्मिक पुरावे नवनाथ कथासारात आहेत. शिवचरित्रात छत्रपती शिवाजींचा सुरतेच्या लुटीच्या दरम्यान येथील दर्शनाचा संदर्भ काही इतिहासकारांनी नोंदविलेला आहे. पेशवे आणि अहिल्याबाई होळकर यांनी येथील जलकुंड आणि मंदिराचा जिर्णोधार केल्याचे काही संदर्भ सांगितले. शिर्डीच्या साईबाबांची भगवतीच्या श्री सप्तशृंग स्वरूपावर नितांत श्रद्धा होती. बाबा बऱ्याचदा भगवती दर्शनासाठी येथे आल्याचे तसेच तात्या कोते (बाईजा कोते यांचा मुलगा) या मानलेल्या भावासाठी बाबांनी भगवतीला नवस देखील केल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत.
अशी आहे देवीची कथा…
(Saptashrungi Devi Vani)
राजा दक्षाने केलेल्या यज्ञात शिवशंकर भगवानांचा अर्थात पतीचा झालेला अवमान सहन न झाल्याने सतीने यज्ञात आहुती देत स्वत:चा जीवन प्रवास संपविला असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडवनृत्य करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला. सगळीकडे निसर्गाने कोप घेतला. हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल. म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले. सुदर्शनचक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले, तेव्हा शिवाचा राग शांत झाला. त्याच क्षणी शिव भानावर आले आणि त्यांनी सतीचे असे तुकडे पाहून विष्णूंना श्राप दिला. या शापाला मोडण्यासाठी विष्णूंनी एकावन्न सतीच्या शक्तिपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवींनी विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले. तेव्हा विष्णूंनी शिव-शंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची पुत्री बनून येईल आणि पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल. या घटनेत सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात एकावन्न जागांवर पडले म्हणून यांना एकावन्न शक्तिपीठ म्हणतात. सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षायानी नावाने ओळखतात. तसेच या व्यतिरिक्त देवीचे तीन महत्वाचे स्वरूप मानले जातात. त्यात प्रामुख्याने महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांचा समावेश होतो. असे एक त्रिगुणात्मक स्वरूप अर्थात श्री सप्तशृंगी माता उर्फ वणीची देवी किवा नांदुरी गडाची देवी अशी या तीर्थक्षेत्राची ओळख आहे.
देवीच्या सर्व स्वरुपांचे नवरात्रीत पूजन ….
आध्यत्मिक सेवेत शाक्त, शैव, वैष्णव, महानुभव, नाथ आदी विविध पंथ व संप्रदायातील अनुभव, अनुभूती व श्रद्धेवर देवदेवतांची साधना अवलंबून आहे. त्यातील शाक्त हा एक महत्वाचा पंथ असून ज्यात देवीची अर्थात शक्तीची सात्विक पध्दतीने वैदिक मंत्रोच्यारात पुजा केली जाते. या पंथाची स्थापना नाथजोगी नावाच्या सांप्रदायिकांनी केली. नाथानी या संबंधी शिवपार्वती संवादरूप अनेक ग्रंथ लिहिले. त्यास तंत्र असे म्हणतात. त्यात पूजा, न्यास, मुद्रा, बीजाचे मंत्र वगैरे अनेक विधी समाविष्ट आहेत. यातील देवतांस दशमहाविद्या असे म्हणतात. दशमहाविद्या प्रकारात प्रामुख्याने श्यामा, तारा, त्रिपुरा, बगलामुखी, छिन्नमस्तका, मातंगी, धुमावती, भैरवी, महाविद्या व भुवनेश्वरी असे देवीचे विविध स्वरूप असून याव्यतिरिक्त ९ दुर्गा प्रकारात देखील देवीची पूजा केली जाते, त्यात शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौर व सिद्धिदात्री असे स्वरूप समाविष्ट आहेत. या सर्व स्वरूपांचे नवरात्रीत विशेष पूजन केले जाते.
गडावर जाण्यासाठी व राहण्यासाठी व्यवस्था…
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान नाशिकच्या सप्तश्रृंगीगडाला आहे. सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी दहा किलोमीटरचा घाट पार करून जावे लागते. नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावर सप्तशृंगी तीर्थक्षेत्र आहे. शिर्डी पासून 125 किलोमीटर अंतरावर सप्तशृंगीगड आहे. औरंगाबाद या ठिकाणावरून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर सप्तशृंगीचे ठिकाण असून मुंबई सप्तशृंगीडापासून ३५० किलोमीटरवर आहे. सप्तशृंगी गडावरून त्र्यंबकेश्वर, गुजरात मधील सापुतारा व शिर्डी आदी ठिकाणे जवळ असून या ठिकाणी भावीक भक्तांना राहण्यासाठी देवी संस्थांचे भक्त निवास असून वीस रुपयांमध्ये महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सप्तशृंगीगड निसर्गरम्य पर्यटनस्थळ असल्याने या ठिकाणी गुजरात, मध्य प्रदेश व इतर भारतातील भाविक भक्त येत असतात. या ठिकाणी वर्षातून नवरात्रोत्सव व चैत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. तसेच सप्तशृंगी देवीच्या शिखरावरती ध्वज लावण्याची 500 वर्षाची परंपरा कायम आहे.
गडावर होणारे महत्वाचे उत्सव
चैत्र नवरात्र (रामनवमी ते हनुमान जयंती), अश्विन / शारदीय नवरात्र (घटस्थापना ते दसरा), शाकंबरी पौर्णिमा (माहे जानेवारी), कोजागिरी पौर्णिमा, दर महिन्याची दुर्गाष्टमी (नवचंडी व नगर प्रदक्षिणा उपक्रम) व पौर्णिमा उत्सव महत्वपूर्ण मानले जातात. मोठ्या संख्येने या काळात भाविक गडावर दर्शनासाठी येतात. यासह वर्षभरात धनुरमास (डिसेंबर-जानेवारी), कृष्णजन्माअष्टमी, गणेश जयंती, हनुमान जयंती, रामनवमी, कालभैरव जयंती इत्यादी उत्सव वर्षभरात न्यासाच्या वतीने साजरे केले जातात.
नवरात्र काळात मा. विश्वस्त मंडळ प्रतिनिधीना मानाची पूजा (महापूजा) करण्याचा व पौराणिक परंपरेनुसार दरेगाव येथील गवळी समाजातील कुटुंबाला चैत्र व अश्विन नवरात्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला श्री. भगवतीच्या शिखरावर ध्वजारोहण करण्याचा मान दिला जातो.
व्यवस्था आणि सेवा सुविधा
वर्षभरात या आद्यशक्ती पिठाला दर्शनासाठी अंदाजे ४० लाख व त्यापेक्षा अधिक भाविक महाराष्ट्र व गुजरात राज्यासह इतर राज्यातून मोठ्या संख्येने येतात. त्यासाठी विश्वस्त संस्थेच्या वतीने विविध सेवा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्या प्रामुख्याने पुढील प्रमाणे-
धार्मिक पूजा विधी सुविधा :
विविध ठिकाणावरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या धार्मिक पूजा विधी साठी विश्वस्थ संस्थेने पहिली पायरी येथे भव्य चिंतन सभागृह उभारला असून तेथे भाविकांना चिंतन, पूजा व पाठ वाचण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच नाममात्र दरात श्री भगवतीच्या विविध पूजा, आरत्या तसेच यज्ञ सेवा कार्यान्वित केल्या आहेत.
श्री. भगवतीच्या दैनंदिन पूजा, आरती, पंचामृत महापूजा आणि मासिक नवचंडी यज्ञ आदींचा तपशील
१. काकड आरती – स.५.३० – ६.००वा.
२. पंचामृत महापूजा – स.७.००-९.३०वा.
३. महानैवद्य आरती – दु.१२.००-१२.३०वा.
४. सांज आरती – सायं.७.००-८.००वा.
५. नवचंडी याग (यज्ञ) महिन्याच्या दुर्गाष्टमी व कालाष्टमीच्या मुहूर्तावर स.९.३०-३.३०वा.
पुरोहित वर्ग : परंपरेनुसार दिक्षित व देशमुख परिवार (घराण्याला) भगवती पूजेचा मान देण्यात आलेला आहे.
भक्तनिवास व्यवस्था…
विविध ७ भक्तनिवास (इमारती) व्यवस्थेअंतर्गत एकूण २२५ खोल्या, १+३+२ = ६
सभागृह असे मिळून २३१ खोल्या अंतर्गत अधिकतम १२५० व्यक्तींची राहण्याची
व्यवस्था आणि एकूण ६ सभागृहाच्या माध्यमातून एकूण १५०० लोकांची निवास
व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अन्नपूर्णा प्रसादालय…
एकाच वेळेस एकूण २,००० भाविक प्रसाद घेवू शकतील इतकी मोठ्याप्रमाणावर बैठक
व्यवस्था आणि आधुनिक यंत्र सामग्रीसह महाप्रसादाची व्यवस्था न्यासांतर्गत
उभारण्यात आलेली आहे. या सुविधेअंतर्गत प्रत्येक महिन्याची पौर्णिमा,
दुर्गाअष्टमी व चैत्र व अश्विन नवरात्रीत भाविकांना देणगीदार भाविक व
न्यासाच्या खर्चातून मोफत अन्नदान सुविधा दिली जाते.
धर्मार्थ दवाखाना…
देवस्थान अंतर्गत भाविक आणि स्थानिक ग्रामस्थांसाठी प्राथमिक स्तरावर मोफत
निदान, उपचार सुविधा दिली जाते. तसेच अत्यावश्यक उपचारासाठी २ वाहनाच्या
माध्यमातून मोफत रुग्णवाहिका सुविधा पुरवली जाते.
स्वच्छता आणि सुरक्षा…
भाविकांसाठी २४ तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध असून, देवस्थान आणि गावातील
संपूर्णता स्वच्छता देवस्थानच्या स्वच्छता विभागा अंतर्गत केली जाते.
ए.टी.एम सुविधा…
विविध ठिकाणावरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आर्थिक सुविधा व्हावी
म्हणून न्यासाने नुकतीच महाराष्ट्र बँक व भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध
ए.टी.एम. सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे भाविकांना विशेष सुविधा देणे शक्य
झाले.
आणखी काही महत्वाचे…
मंदिर परिसरात विविध मंदिरे आहेत. त्यात प्रामुख्याने म्हैशासुर मंदिर, राम मंदिर, राध्ये-शाम मंदिर, दत्त मंदिर, कालभैरव मंदिर, नागाई माता मंदिर, मुंब्बादेवी मंदिर, शनी व मारुती मंदिर आदींचा समावेश होतो. त्या व्यतिरिक्त ६० पायरी गणेश, मार्केंड डोंगर, भुवनेश्वर शंकर – मार्केंडपिंपरी, निराकार रूप: वणी येथिल भगवती माता, परशुराम बाळा, १०८ जलकुंड (कालिका, तांबट, देव नळी, ईटाळशी, पंजाबी, खर्जुल्या, लक्ष्मी, चांभार, सूर्य, चंद्र आदी कुंड असून इतरांचा शोध सुरु आहे. शिवालय तलाव, हनुमान मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, कालेश्वर मंदिर, नवनाथ गुफा, दरेगाव बारीतील डोंगर व विविध सौंदर्याने नटलेला निसर्ग हा बघण्यासारखा आहे.
दुर्गेचे दुसरे रूप : ब्रह्मचारिणी
दधाना करपद्माभ्यामक्षमाला कमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥ ‘नवशक्तींपैकी ‘ब्रह्मचारिणी’ हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. (Navratri 2023 Brahmacharini) येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. (Navratri 2023 Brahmacharini)
या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी नारदमुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा, यासाठी कठोर तपस्या करायला सांगितले होते. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.
अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की, ‘हे देवी! तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील, ‘ असा वर त्यांनी दिला. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.
श्री अंबाबाईचा मौल्यवान खजिना
श्री अंबाबाई देवीला तत्कालीन राजवटींकडून दागदागिन्यांसह अनेक दान म्हणून आहेत. (Navratri 2023 Ambabaiche Dagine) करवीर छत्रपती दुसरे संभाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत तत्कालीन करवीर राज्य अधिपतींनी देवीला अलंकार अर्पण केले आहेत. सातारा छत्रपती घराण्यातून देवीला जडजवाहिर अर्पण करण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ग्वाल्हेरकर शिंदे घराण्यासह अनेक सरदार, संस्थानिकांनीही देवीला वेळोवेळी अलंकार अर्पण केले आहेत. (Navratri 2023 Ambabaiche Dagine)
- Saptashrungi Devi Vani : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी देवी
- Chathushringi temple : चतुःशृंगी मंदिराचा जीर्णोद्धार; भाविकांसाठी दर्शन खुले राहणार
- नवदुर्गा : जागृत आदिशक्तीचा जागर
तन्मणी :
सोन्याच्या सुबक व रेखीव अशा मण्यांनी सुसर अशी देवीची तन्मणी आहे. अत्यंत नाजूक कलाकुसर केलेले मणी यामध्ये आहेत. मण्यांचा एकसारखेपणा असावा याची विशेष कण्यात आली आहे.

ठुशी :
कोल्हापुरी बनावटीची लहान सोन्याच्या मण्यांच्या गुंफणातून तयार करण्यात आली आहे. मणी गादीवर याचे काम करण्यात आले आहे. देवीचा हा दागिना असा तयार केला आहे की, घातल्यानंतर तो जराही टोचत नाही.

मयुराकार जडावाची कवचकुंडले व पान :
देवीच्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या कवचकुंडलांना विशेष स्थान आहे. मयुराकार कुंडलांनी देवीचे रूप अधिक खुलते. पुष्कराज, श्रीलंकन नारंगी पुष्कराज यासह लाल, पांढरे व काळ्या रंगाचे खडे असणारा आहे. पानातही रत्ने आहेत. याला मयुर कर्णफुले असेही म्हणतात.
कवड्यांची माळ :
अंबाबाईला कितीही रत्नालंकारांनी मढवले तरी तिचा खरा दागिना म्हणजे कवड्यांची माळ, असे मानले जाते. देवीची कवड्यांची माळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. लहान-लहान कवड्यांची फुले गुंफून ही माळ बनवण्यात आली आहे. मूळ मूर्ती व उत्सवमूर्ती यांना नेहमी कवड्यांची माळ घातली जाते. कितीही सोन्याचे व रत्नजडित दागिने घातले तरी कवड्यांच्या माळेमुळे देवीचे रूप अधिक खुलून येते.

गदा आणि म्हाळुंग :
परमेश्वरी व विश्वाची मूलप्रकृती अशी महालक्ष्मी त्रिगुणात्मक असून लक्षरूपाने अखिल विश्वास व्यापून राहिलेली आहे. मातृसिंग, गदा खेटव पानपात्र धारण करणाऱ्या, मस्तकावर नाग लिंग आणि योनी धारण करणाऱ्या शुद्ध झालेल्या सुवर्णाच्या अलंकारांनी नटलेल्या तिने हे सर्व शून्य विश्व आपल्या तेजाने भारून टाकले आहे अशी स्तुती ‘श्री दुर्गा सप्तशती मध्ये श्री महालक्ष्मीची करण्यात आली आहे. वर्णनानुसार देवीच्या हाती जी आयुधे आहेत. त्यांचेही महत्त्व आहे. हातातील म्हाळुंग हे मातृशक्तीचे प्रतीक आहे. प्रतीक आहे.

या देवीच्या हाती असलेली गदा है क्रियाशक्तीचे प्रतीक आहे. तर रक्षणशक्तीचे प्रतीक ढाल आहे. यापैकी गदा आणि म्हाळुंग हे सोन्यात मढवलेले असून ते देवीच्या नित्यपूजेसाठी वापरले जाते. सोन्यात मढलेल्या गदाधारी अंबाबाईचे रूप अतिशय सुंदर दिसते.

मोतीहार :
देवीचे दोन, चार व सातपदरी मोत्याचे हार आहेत. हारांमध्ये उच्चप्रतीच्या मोत्यांचा वापर मोत्यांचा वापर केला आहे. काही मोतीहारांमध्ये सोन्याचे पदकही वापरण्यात आले आहेत. सात पदरी मोतीहारामध्ये लहान-लहान पदके वापरण्यात आली आहेत. यामध्ये लफ्फा मोतीहारही आहे. सोन्याचे मणी व मोत्यांचा हार दुर्मीळ मानला जातो.
आणि म्हणून या गावात मोहटा देवीच्या आशिर्वादाने दूध, तूप विकलं जात नाही
पाथर्डी शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर पूर्व भागातील उंच डोंगरावर मोहटादेवीचे स्वयंभू स्थान आहे. देवस्थान समितीने लोकवर्गणीतून कोटयावधी रूपये खर्चुन भव्य मंदिर उभारले आहे. देशातील देवी मंदिरापैकी सर्वात मोठे आकर्षक मंदिर सुध्दा प्रेक्षणीय असून संपूर्ण मंदिराची रचना श्री यंत्रकार आहे. आश्विन शुद्ध प्रतिप्रदेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत अशी पंधरा दिवस यात्रा येथे चालते. नवसाला पावणारी अशी या मोहटा देवीची ख्याती आहे. जागांच्या कल्याणासाठी रेणुकादेवी येथे प्रकट झाली आणि मोहटा देवी म्हणून प्रसिद्ध झाली अशी आख्यायिका सांगितली जाते.
घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव चालतो. या घटस्थापने दिवशीही रविवारी सकाळी अकरा वाजता देवीचा मुखवटा वाजत गाजत मोहटे गावातून देवी गडावर येऊन त्यानंतर घटस्थापना होईल. भजन, कीर्तन, जागर, हरिपाठ, गड प्रदक्षिणा, गोंधळ गीते, सुवासिनी पूजन, होमहवन असे विविध कार्यक्रम उत्सव कालावधीत होणार आहेत. देवीचे मंदिर अहोरात्र देवी भक्तांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवाची मोहटा देवस्थानात तयारी पूर्ण झाली असून अष्टमी होमापर्यंत घटीस ( अनुष्ठानास) बसणाच्या महिला राज्याच्या विविध भागातून दाखल होत आहेत.रविवार दि. १५ सकाळी ११ वाजता जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीच्या अध्यक्ष सुनिल गोसावी यांच्या हस्ते घटस्थापना होऊन पारंपरिक उत्सवाला प्रारंभ होणार असल्याची माहिती मोहटा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.

मोहटा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहता मोहटा देवस्थानने भाविकांच्या सोयी सुविधांसाठी संपूर्ण तयारी केली असून आरोग्य,सुलभ दर्शन बारी, पिण्याचे पाणी, सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, घटी बसणाऱ्यांना भाविकांसाठी फराळाचे वाटप,देवीची दोन वेळेची आरतीचे एलईडी टीव्ही वरती मंदिर परिसर प्रक्षेपण, ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठीं मंदीर परिसरात मंडप व्यवस्था आदी सोयी सुविधा देण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडूनही यंदाच्या भाविकांचा गर्दीचा उच्चांक पाहता सुरक्षेच्या दृष्टीने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, होमगार्ड, स्वयंसेवक भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.
असा आहे नवरात्रीचा सोहळा :
दि. १५ ते २३ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील नामावंत कीर्तनकाराचे कीर्तन रोज रात्री होईल. २३ ऑक्टोबर रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. अष्टमी होमहवन २२ ऑक्टोबर रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा यांचे हस्ते होईल. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सिमोल्लंघन सोहळा, शस्त्रपूजन होईल. दि २५ ऑक्टोबर मोहटा देवीची यात्रा असून गावात दिवसभर पालखी दर्शन रात्री उत्सव मूर्तीची पालखी मिरवणुक निघुन मध्यरात्री नंतर गडावर शोभेची दारू उडविण्यात येणार आहे. २७ ऑक्टोबरला सकाळी कलाकारांच्या हजेच्या व दुपारी कुस्त्यांचा हंगामा होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.कोजागिरी पौर्णिमेला रात्री महाआरती व दुग्धप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होईल. नवरात्र काळात कुमारिका पूजन, सुवासिनीची ओटी भरणे, दृष्ट काढणे, कुंकुमार्चन पूजा, आदी विधी वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साजरे होतात. राज्याच्या विविध भागातून घटी बसविणाऱ्या सुमारे दहा हजार महिला मंदिराच्या पारायण व महाप्रसाद हॉलमध्ये दाखल होत आहेत. सुसज भक्तनिवास, अहोरात्र मोफत महाप्रसाद ,विशेष अतिथी निवास, भव्य वाहनतळाची सुविधा आहे. मुख्य दर्शन मार्गामध्ये अष्टभैरव, चौसष्टयोगिनी, दशमहाविद्या मंदिर आहेत. सुमारे दोनशे किलोमीटर परिसरातून भाविक पायी चालत दर्शनासाठी येतात.
इथे दूध, तूप विकलं जात नाही…
एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा वाट चुकलेल्या म्हशी आल्या. म्हशी काही दिवस सांभाळून ज्यांच्या असतील त्यांना देऊ अशीच भावना ठेवून ग्रामस्थांनी त्या ठेवून घेतल्या. अनेक दिवस वाट पाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांच्या नाकेदारांना कळली व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला. आणि त्यांना बोलावून बंदिस्त करण्याचे आदेश केला. चोरीचा आळ आलेल्या बिचाऱ्या भक्तांस या गोष्टीचे खूप दुःख झाले. दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोहटादेवीची आळवणी केली.
खडा पहारा केला उपवास केला व नवस केला. आई, यापुढे आम्ही गायी-म्हशीचे दूध, तूप, विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणारदेखील नाही, परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहून मोहटादेवीची कृपा झाली. दुसऱ्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतून म्हशीचा काळा रंग बदलून पांढरा झाला. आदल्या दिवशी पाहिलेल्या ह्या म्हशी नाहीत हे नाकेदारांच्या लक्षात आले.व त्यांनी बंदिस्त करण्याचा हुकुम रद्द केला. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दूध, दही, तूप विकत नाहीत. व देवीस अर्पण केल्याशिवाय खातही नाहीत.
कसे जाल ?
मुंबई पासून : मुंबई ते अहमदनगर या मार्गावर बस, रेल्वे किंवा खासगी वाहनाने जाता येते
पुण्याहून : पुणे ते नगर हे अंतर जवळपास तीन तासांचे आहे. पुण्याहून बसने सहज जाता येते.
नगरला पोहोचल्यानंतर नगर ते पाथर्डी या साठी अनेक बस किंवा खासगी वाहने उपलब्ध असतात.
पाथर्डीला पोहोचल्यानंतर तिथून देवीच्या गडावर जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध आहे.
महती नवदुर्गांची : श्रीगजेंद्रलक्ष्मीदेवी (श्रीगजांबिका)
नवदुर्गांतील अष्टदुर्गादेवी म्हणजेच श्री गजेंद्रलक्ष्मीदेवी (श्रीगजांबिका) होय. जुना बुधवार पेठ परिसरातील तोरस्कर चौक, ब्रह्मपुरी येथील चर्चसमोर देवीचे मंदिर आहे. काळ्या पाषाणाची तीन फूट उंचीची देवीची बैठी मूर्ती आहे. हनुमंत, महादेव या परिवार देवता देवळा शेजारीच आहेत.
दैव-दैत्यांच्या समुद्र मंथनातून प्राप्त झालेले महालक्ष्मी हे प्रथम दिव्यरत्न. कमळावर बसलेल्या अत्यंत सुंदर, पवित्र व मनोहर अशा महालक्ष्मी मातेस प्रथम अष्टदिग्गजांनी आपल्या सोंडेत सुवर्णकलश घेऊन त्यातील अमृतजलाने महामस्तकाभिषेक केला. या जगदंबेच्यापूजनीय स्वरुपास श्री ‘गजेंद्रलक्ष्मी’ असे म्हणतात. ऐश्वर्याच्या परमावधीचे प्रतीक म्हणून या देवीची उपासना करतात. कोल्हापुरातील हे स्थान अत्यंत प्रासादिक व जागृत आहे. (संदर्भ : श्री नवदुर्गायात्रा मार्गदर्शन)
चांदवडची राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका माता

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेचे (Renuka Mata Mandir) प्राचीन, जागृत व प्रसिध्द देवस्थान नाशिक जिल्हयातील चांदवडला स्वयंभू विराजमान झाले आहे. श्री रेणुका मातेचे हे मंदिर सहयाद्री पर्वतरांगेतील निसर्गरम्य परिसरातील टेकडीच्या गुहेत वसलेले आहे. नाशिक जिल्हयातील धार्मिक स्थळांपैकी एक सुप्रसिध्द देवस्थान असल्याने भाविकभक्तांची दर्शनासाठी बाराही महिने वर्दळ असते. शारदीय नवरात्रोत्सव व चैत्र पौर्णिमेला भाविकांची प्रचंड गर्दी असते. जाणून घेऊया या मंदिराची आख्यायिका…
देवीेचे धड माहूर तर शीर चांदवड येथे…
चांदवड शहरातून गेलेल्या मुंबई आग्रा महामार्गा शेजारील सहयाद्री पर्वताच्या डोंगररांगेत श्री रेणुकामाता स्वयंभू विराजमान झाल्या आहेत. हे देवस्थान साडे तीन खंडपीठापैकी अर्ध्ये पीठ म्हणून ओळखले जाते. श्री जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार पुत्र परशुरामाने स्वताच्या आईचे शीर धडा वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले होते. त्यावेळी देवीच्या धडाचा भाग माहूर (ता. किनवट जी. नांदेड) येथे असून शीर चांदवड येथे आहे. त्यामुळे या देवीला महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून प्रसिध्द असलेली जगतजननी, चांदवड निवासीनी राजराजेश्वरी, कुलस्वामिनी श्री रेणुकामाता म्हणून ओळखले जाते. (Renuka Mata Mandir Chandwad)
नवरात्रीत 10 दिवसांचा यात्रोत्सव…
या ठिकाणी भाविकांनी अर्पण केलेले सर्व नवस, आराधना माता पूर्ण करते. या भावनेने संपूर्ण राज्यातून व देशातून भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात. पूर्ण झालेले नवस मोठ्या श्रद्धेने फेडतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रात १० दिवस व चैत्र पौर्णिमेला एक दिवस या ठिकाणी भव्य यात्रोत्सव साजरा केला जातो. या नवरात्र उत्सव काळात हजारो स्त्री, पुरुष मोठ्या श्रद्धेने मंदिराच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात घटी बसतात. नवरात्रात दुर्गाष्टमिला नवचंडी होमहवन होत असतो. या उत्सव काळात श्री रेणुका मातेच्या शृंगाराची विधिवत सकाळ व सायंकाळच्या वेळी संपूर्ण गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येते. तसेच दर महिन्यास असलेल्या पौर्णिमेला पालखी मिरवणूक काढण्यात येते.
१७३५ ते १७९५ कालावधीत मंदिराचा जीर्णोधार
ब्रिटीश कालीन सरकारच्या ताब्यात असलेल्या या पुरातन कालीन मंदिराचा जीर्णोधार पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी सन १७३५ ते १७९५ या कालावधीत केला आहे. या मंदिरात दीपमाळ, पायऱ्या, मुख्य दरवाजा, सभा मंडप, तीर्थ तलाव, आदीचे बांधकाम केले आहे. श्री अहिल्याबाई होळकर या त्यावेळी भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुका मातेचे अलंकार व पूजापाठ साहित्य घेऊन पूजा करीत असत. हीच प्रथा अहिल्यादेवीनंतर होळकर घराण्याकडून होत आहे. सध्या होळकर ट्रस्ट रंगमहाल मार्फत दर पौर्णिमेस व चैत्र पौर्णिमेस व नवरात्रात दहा दिवस पालखी काढण्यात येते. तसेच अहिल्याबाई होळकर यांनी लाकडी कोरीव कामात अप्रतिम असा ऐतिहासिक रंगमहाल या वास्तूचे बांधकाम केले आहे. या रंगमहालाला पुरातन रूप देण्यासाठी पुरातत्व विभागामार्फत काम सुरु आहे. मात्र हे काम गेल्या पाच ते सहा वर्षापासून बंद असल्याने रंगमहालाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रंगमहाल बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे. यामुळे या महालाचे बंद पडलेल्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देऊन रंगमहाल पर्यटकांसाठी खुला करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. (Renuka Mata Mandir Chandwad)
पोर्णिमेला पालखीची पंरपरा…
दरवर्षी नवरात्र उत्सव काळात श्री रेणुका मातेची भव्य अशी यात्रा भरत असल्याने येथे हजारो भाविक भक्त आपल्या आराध्यदैवताच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. या मंदिराच्या उजव्या बाजूला रासलिंग इंद्रायणी किल्ला तर डाव्या बाजूस भगवान शिवशंकराचे चंद्रेश्वर मंदिर आहे. दर पौर्णिमेस रेणुकादेवीची पालखी सकाळी अहिल्यादेवींच्या रंगमहालातून देवीच्या मंदिरात जाते व सायंकाळी मंदिरातून रंगमहालात जाते, या पालखी मिरवणुकीच्या वेळी सुहासीनी आपआपल्या घरापुढे मनोभावे पालखीची पूजा करतात. ही प्रथा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. चैत्र पौर्णिमेला एक दिवस व अश्विन शुद्ध प्रतीपदेपासून दशमीपर्यत दहा दिवस यात्रा उत्सव साजरा केला जातो. या उत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या उत्सव काळात भाविक आपले नवस नारळ, हळदी कुंकू वाहून व जावळ काढून फेडतात. यात्रेच्या काळात फुलांच्या माळा, हार, नारळ यांची मोठ्या प्रमाणात दुकाने लावून त्यांची विक्री केली जाते. या यात्रोत्सव काळात पहाटे चार वाजेपासून देवीचा महाभिषेक केला जातो. यावेळी नामवंत कीर्तन प्रवचन करांचा लाभ भाविकांना होत असतो.
भाविकांसाठी सोयी-सुविधा
या जागृत स्वयंभू पुरातन कालीन श्री रेणुका देवी मंदिराचा कारभार अनेक वर्षापासून अहिल्यादेवी होळकर सरकारकडे होता. सध्या मंदिराचा संपूर्ण कारभार ट्रस्टकडे असल्याने मंदिराच्या परिसरात सुशोभितपणा करण्यात आला आहे. हया ट्रस्ट मध्ये भारत सरकारचे प्रतिनिधी असल्याने यावर भारत सरकारचे नियंत्रण आहे. या मंदिराची देखभाल करण्याचे कामकाज ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर के. पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार करीत आहेत. ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार यांनी व्यवस्थापनेच्या कारकिर्दीत मंदिराच्या परिसरात भाविकांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. त्यात पिण्याचे पाणी, विजेचे मोठे लाईट, भाविकांना घटी बसण्यासाठी निवासगृह, दर्शनासाठी बॅरिकेटीग, विद्युत जनरेटर, बटरी इन्व्हर्टर, पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेल, लग्न समारंभ व धार्मिक कार्यक्रमासाठी मोठी जागा व स्वयंपाकाची भाडी, विद्युत घंटा, क्लोज सर्किट, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच चांदवडचे विधानसभेचे आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या निधीतून यात्रा स्थळ विकास निधीतून भक्त निवास, विश्राम गृह, स्त्रियांसाठी प्रसाधन गृह, शिर्डीच्या धरतीप्रमाणे रांगा लावणेसाठी स्टीलचे बॅरिकेटीग, वाहनतळ, संपूर्ण मंदिर परिसरात सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसराला एक वेगळी झळाळी मिळाली आहे.
देवस्थानाला “ब’ वर्गाचा दर्जा
चांदवडच्या श्री रेणुकामाता मंदिर देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो भाविक भक्त श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. या मंदिराची देखभाल व्यवस्थापक मधुकर पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, विलास पवार, विजय जोशी, अमोल कुलकर्णी, हरेंद्र वैद्य, तानाजी आहेर, नारायण कुमावत, हरिभाऊ कासव आदी करीत आहे.
मंदिरापर्यंत कसे जाणार?
विमानाने- नाशिक येथून जवळच ओझर विमानतळ आहे. तेथून तुम्ही प्रायव्हेट वाहन किंवा बसने जाऊ शकता. रस्त्याने – नाशिकपासून चांदवड हे 65 किलोमीटर आहे, प्रायव्हेट वाहन किंवा बसनेही तुम्हाला जाता येईल.
५१ शक्तिपीठांपैकी एक श्रीलंकेतील प्रसिद्ध लंका शक्तिपीठ
पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेतील प्रसिद्ध असे लंका शक्तिपीठ. हे शक्तिपीठ जाफनापासून फक्त ३५ किलोमीटर आहे. (Lanka Shaktipeeth) नल्लूर येथे हे मंदिर असून त्यास “इन्द्राक्षी शक्तिपीठ” नावाने ओळखले जाते. लंका शक्तिपीठ त्रिकोणेश्वर मंदिराच्या जवळ आहेय देवराज इंद्रने येथे काली मातेची पूजा केली होती. रावण आणि भगवान राम यांनी येथे देवी शक्तीची पूजा केली होती. (Lanka Shaktipeeth)
पुराणानुसार जिथे देवी सतीच्या शरीराच्या अवयव वा दागिने पडले. तिथे शक्तिपीठ बनले. हे शक्तिपीठ पवित्र तीर्थ म्हटले गेले. जे संपूर्ण भारतीय उपमहाद्वीपमध्ये पसरले गेले आहेत. देवीपुराणात ५१ शक्तिपीठांचे वर्णन करण्यात आले आहेत. श्रीलंकेतील लंका शक्तिपीठमध्ये माता सतीचे “पैंजण” (नूपुर) पडले होते. येथे माता सतीला ‘इन्द्राक्षी’ आणि भगवान शिवला ‘राक्षसेश्वर’ म्हटलं गेलं.
लंका शक्तिपीठाची कथा
५१ शक्तिपीठांमध्ये लंका शक्तिपीठाचा समोवश आहे. प्राचीन कथे नुसार, भगवान शिव यांचे सासरे राजा दक्ष यांनी यज्ञाचे आयोजन केलं होतं. यामध्ये त्यांनी शिव भगवान आणि माता सती यांनी निमंत्रण पाठवले नाही. कारण, राजा दक्ष भगवान शिव यांना आपल्या बरोबरीचे मानत नव्हते.
ही गोष्ट माता सती यांना आवडली नाही. त्या निमंत्रणाशिवाय, यज्ञात सहभागी झाले. यज्ञ स्थळी भगवान शिव यांचा अपमान झाला, जे माता सती यांना सहन झाले नाही आणि त्यांनी हवन कुंडात उडी घेतली.
भगवान शिव यांना ही गोष्ट जेव्हा समजली. तेव्हा ते तिथे पोहोचले आणि माता सती यांच्या शरीराला हवन कुंडातून काढून तांडव करू लागले. त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात गोंधळ निर्माण झाला होता. संपूर्ण ब्रह्मांडला या संकटातून वाचवण्यासाठी भगवान विष्णूने माता सती यांच्या शरीराला आपल्या सुदर्शन चक्राने ५१ भागांमध्ये विभागणी केली, जे अवयव जिथे जिथे पडले, ते शक्तिपीठ बनले.
कोल्हापूरचे शिल्पकलेचे वैभव असणारे मंदिर
सोमवार आश्विन शुद्ध दशमी, मन्मथ संवत्सर. २६ सप्टेंबर १०१५
नोंदीप्रमाणे अनंत अशा कालप्रवाहातील एक दिवस. (Navaratri 2023) मात्र,
कोल्हापूर नगरीच्या इतिहासाचे सुवर्णपान याच दिवशी लिहिले गेले.
अज्ञातवासात असलेली क्षेत्रस्वामिनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी आपला
अज्ञातवास संपवून भक्त कल्याणासाठी पुन्हा मंदिराच्या गर्भकुरीत विराजमान
झाली. (Navaratri 2023 )
शककर्ते छ. शिवरायांनी मराठ्यांचे स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याचा
सूर्योदय या भूमीला दाखविला.(Navaratri 2023) तत्पूर्वी आदिलशाही, मोगल
पातशाही, बहामनी या राहिल्यामुळे शिल्पकतेचे वैभव असणारी मंदिर आणि
त्यामधील मूर्ती शिल्पेन करणे पुजारीवर्गाच्या आवाक्याबाहेरचे बनले होते.
नोंदीप्रमाणे हे अनादि क्षेत्र त्यास अवांतराचे योगास्तव बहुत कल्याणासाठी
देवीची विधीपूर्वक दिवस पूर्वी देवालय सोडून पुजारी यांचे घरी होती’ असा
उल्लेख सापडतो. यावरून मंदिरामध्ये श्रीमूर्ती सुरक्षित नसल्याने
श्रीपूजकांपैकी कोणीतरी आपल्या घरी नेऊन जतन केल्याचे समजतेय. ()
कालक्रमाने शिवशाही स्थिरावली. स्वतेच्या चित्तात स्थिरता आली आणि नरहरी सायगावकर यांना स्वप्नात दृष्टांत देऊन देवीने पूर्वस्थ बसण्याची इच्छा व्यक्त केली. नरहरी भटांनी ही गोष्ट छ. राजारामांचे पुत्र करवीर संभाजी पहिले (छ. शिवरायांचे नातू यांच्या कानावर पडली. संभाजी छत्रपतींनी मतद सिदोजी हिंदुराव घोरपडे यांना आशा श्रींची मूर्ती विधिवत मंदिरात स्थापन केली. छत्रपतींच्या पत्रांमध्ये मूर्तीची विधीपूर्वक स्थापना करण्याने ‘स्वापीस व स्वामीच्या राज्यास बहुत कल्याणवह आहे असा उल्लेख आहे. यावरून संभाजीराजे यांची महालक्ष्मीवर किती श्रद्धा होती, हे दिसून येते. इतकेच नव्हे तर राज्याच्या कल्याणासाठी देवीची विधीपूर्वक नित्यपूजा अखंडपणे चालावी यासाठी सावगावकरांना वमशपरंपरागत हक्काने काही जमिनी वतने दिली.
सांगावकर प्रधान, पोरपडे आणि श्रीपूजक यांच्या समन्वयातून मंदिरात श्रींची पूजा कालक्रमाने शिवशाही स्थिरावली. पूजायांग होत होती. १७३१ साली छत्रपतीच्या दरबारात पूजेच्या हक्काविषयी मुनीश्वर घराण्यातच काही वाद निर्माण झाले. त्याची हकिकतसुद्धा ताराबाईकालीन कागदपत्रे या शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात सविस्तरपणे दिली आहे.
खंड २ रा पृ -११६) यानंतरच्या सुमारे २०० वर्षाच्या कालखंडात मूर्तीविषयी काही नोंदी सापडत नाहीत. मंदिरांना मिळालेल्या अलंकार व जमिनींच्या दानाची पत्रे आहेत.
कोल्हापूरची सर्वागीण प्रगती श्री महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने होत
गेली. आज धार्मिक पर्यटन हे कोल्हापूरच्या आर्थिक विकासाचा महत्वाचा भाग
बनलेले दिसून येते. केवळ महालक्ष्मी दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या
भाविकांमुळे कोल्हापूरच्या कला व कलाकारांना उत्तेजन मिळत राहिले आहे.
मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूजाविधीसाठी थेट आंध्र प्रदेशामधून आलेल्या
मुनीश्वर परिवाराच्या अनेक पिढ्यांनी महालक्ष्मीची सेवा आजतागायत चालू
ठेवली आहे. मुनीश्वर कुटुंबाच्या काही मुलींच्या सासरच्या कुटुंबाकडेसुद्धा
कन्यावारसाने पूजेचे हक्क मिळाल्याने श्री महालक्ष्मीच्या पूजाविधी
करणाऱ्या श्रीपूजक परिवारांचासुद्धा त्यात सहभाग आहे. देवीच्या निमित्ताने
करवीर क्षेत्री अनेक धार्मिक अनुष्ठाने सतत होत राहिल्याने वैदिक पुरोहित
वर्गालासुद्धा आपल्या पारंपरिक व्यवसायातून वृद्धीची दिशा मिळाली.
एक्कावन्न शक्तिपीठांपैकी जगदंबेचे त्रिनेत्र पडलेले शक्तिपीठ आणि काशी
क्षेत्रापेक्षा पुण्यप्रद धर्मक्षेत्र म्हणून कोल्हापूरची ख्याती जगभरात
पसरली. आज एक समृद्ध सांस्कृतिक वारसा संपन्न नगरी म्हणून कोल्हापूरचे नाव
महाराष्ट्रात अग्रक्रमाने घेण्यात येते. तीनशे वर्षांपूर्वी देवीच्या
मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात आजच्या कोल्हापूरच्या वैभवाची बीजे आहेत.
सुरक्षेच्या कारणासाठी पुजारी मूर्ती लपवून ठेवल्याचे स्थान म्हणजे
कपिलतीर्थ या तीर्थकुंडाच्या तीरावरील कपिलेश्वराच्या मंदिरामागे सध्या
रिकामे असलेले मंदिर होते. मूर्ती इथून उपसल्याची जमिनीवर असल्याचेही
दाखवले जाते. मूळ मूर्ती कोणत्या मंदिरात ठेवली असती तर तसा उल्लेख याला
हवा होता. पण कागदपत्रांप्रमाणे मूर्ती कोण्या एका पुजाऱ्याच्या घरी
ठेवल्याचा स्पष्ट शब्दांत उल्लेख आहे. शिवाय एका मोठ्या मंदिरातून देवीची
मूर्ती दुसऱ्या मंदिरात ठेवण्याने सुरक्षेचा प्रश्न तसाच राहतो. म्हणून
ज्या कोणी अज्ञात श्रीपूजकाने राजकीय धामधुमीच्या काळात जगदंबेच्या
मूर्तीला स्वत:च्या घरात सांभाळून जतन केले. त्या पुजाऱ्याचे ऋण करवीर
क्षेत्रावर सदोदित राहतील, यात शंकाच नाही. धर्मप्रवृत्तीच्या करवीरकर
छत्रपती संभाजीराजांनी देवीच्या मूर्ती स्थापनेची आज्ञा दिली हा सुद्धा
जगदंबेचा कृपाप्रसादच.
दुर्गेचे तिसरे रूप - चंद्रघंटा
पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकेर्युता। प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता ॥ दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव ‘चंद्रघंटा’ आहे. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा (Navratri 2023 Chandraghanta ) देवी असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खडग्, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तिचे वाहन सिंह असून, मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते. (Navratri 2023 Chandraghanta )
माता चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयताबरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते. आवाजात मधुरता येते. माता चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात, तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.
महती नवदुर्गांची : श्री महाकालीदेवी (श्री कालाविका)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.
नवदुर्गातील पठदुर्गा देवी म्हणजेच श्री महाकालीदेवी (श्री कालाविका) होय. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते साकोली रस्त्यावर महाकालीचे जुन्या काळातील मंदिर आहे. मंदिरात तीन फूट उंचीची काळ्या पाषाणातील सर्वांगसुंदर मूर्ती आहे. देवी महादेव दत्त, हनुमंत सर्व नवीय सिद्ध पुरुषांच्या पवित्र समाधी या देवीच्या परिवार देवता आहेत.
परात्पर महाकालाची शक्ती. सृष्टीचा लय करणारी देवता, तामसगुणसार, रुद्रस्वरूपा विश्वशक्तीचे आद्यस्वरूप असे महत्व आहे. सृष्टीच्या आरंभी शेषावर योगनिद्रिस्त असणाऱ्या विष्णुच्या कानातून उत्पन्न झालेल्या मधु-कैटभ राक्षसांना मारण्यासाठी देवीला प्रार्थना केली. तेव्हा विष्णूच्या शरीरातून देवी तेज रूपाने बाहेर आली आणि तिने मधु-कैटभ या दैत्यांना ठार मारले. अतिप्राचीन असणारे हे दैवत विरक्तीपूर्ण व लयाच्या प्रतीकयुक्त असते. ही मोहमायेची लय विशुद्ध आत्मज्ञान देते.
दशमहाविद्योपासनेतील कालिकुलाची मुख्यदेवता ब्रह्मस्वरूपा महाकालीची विश्वारंभी दक्षिण भैरव सदाशिवानी प्रथमपूजा केली. त्यामुळे तिला दक्षिणकालिका (दक्षिणेश्वरी) म्हणतात. दक्षिणेकडे मुख असलेल्या कालिकेलासुद्धा दक्षिणकालिकापूजा सर्वाधिक प्रचलित आहे. कानिमंत्रदीक्षामधील कालिमातेचे प्रकार असे- चिंतामणी काली, स्पर्शमणी काली, संततिप्रदा काली, सिद्धकाली, कामकला काली, हंसकाली, गुह्यकाली, भर्दकाली, स्मशानकाली, महाकाली.
दुर्गा मातेची नऊ रुपे कोणती? जाणून घ्या महती आणि कथा
पुढारी ऑनलाईन डेस्क : नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. माता शैलपुत्री दुर्गेचा पहिला अवतार आहे. म्हणून तिला शैलपुत्री म्हणतात. (Navaratri-Nine forms of Goddess Durga) नवदुर्गांमध्ये माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, माता स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धिदात्री आहेत. नवरात्रीतील नऊ दिवस या मातेची आराधना होते. (Navaratri-Nine forms of Goddess Durga)
rga)

दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री
वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम्। वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम् ॥
दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ या नावाने ओळखले जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे ‘तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले आहे. (Navaratri 2023 Shailputri)
या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. (Navaratri 2023 Shailputri) आपल्या पूर्वजन्मात तिने दक्ष प्रजापती राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता. एकदा दक्षाने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले की, प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले, तरीही तिचे समाधान झाले नाही. (Navaratri-Nine forms of Goddess Durga )
सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली. आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे, याची जाणीव होऊन नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले.
याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म ‘घेतला. यावेळी ती ‘शैलपुत्री’ या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. ‘शैलपुत्री’ देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

दुर्गेचे दुसरे रूप – ब्रह्मचारिणी
दधाना करपद्माभ्यामक्षमाला कमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥
‘नवशक्तींपैकी ‘ब्रह्मचारिणी’ हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. (Navratri 2023 Brahmacharini) येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. (Navratri 2023 Brahmacharini)
या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी नारदमुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा, यासाठी कठोर तपस्या करायला सांगितले होते. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात.
अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की, ‘हे देवी! तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील, ‘ असा वर त्यांनी दिला. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.

दुर्गेचे तिसरे रूप – चंद्रघंटा
पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकेर्युता। प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता ॥
दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव ‘चंद्रघंटा’ आहे. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा (Navratri 2023 Chandraghanta ) देवी असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खडग्, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तिचे वाहन सिंह असून, मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते. (Navaratri-Nine forms of Goddess Durga)
माता चंद्रघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयताबरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते. आवाजात मधुरता येते. माता चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात, तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.

दुर्गेचे चौथे रूप- कुष्मांडा
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च । दधाना हस्तपद्माभ्यां कुष्मांडा शुभदास्तु मे ॥
दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ आहे. आपल्या स्मित हास्यातून ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी (Navratri 2023 Kushmanda) असे म्हटले जाते. तिला कुष्मांड (कोहळा) बळी अधिक प्रिय आहे. (Navratri 2023 Kushmanda)
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘अनाहत’ चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिच्या तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भूजा आहेत. ही देवी अष्टभूजा या नावानेही प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांमध्ये क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.
कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगांपासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.

दुर्गेचे पाचवे रूप – स्कंदमाता
सिंहसनगता नित्यं पद्माश्रित करद्वया । शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ॥
दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. (Navratri 2023 Skandamata) भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावानेही ओळखले जाते. ते देवासुर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. (Navratri 2023 Skandamata)
स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे. त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.
स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांची इच्छा पूर्ण होते. मृत्युलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुर्गेचे सहावे रूप – कात्यायनी
चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूल वरवाहना। कात्यायनी शुभं ददयाद्देवी दानव घातिनी ।।
दुर्गेचे हे सहावे रूप ‘कात्यायनी’ या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. (Navratri 2023 Katyayani ) परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. (Navaratri-Nine forms of Goddess Durga)
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले, यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्षे भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.
काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता.
सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता, अशी ही कथा पुराणात आहे.
कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेज:पुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीच्या उजव्या अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते. तो ईहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव होतो. जी व्यक्ती मातेची मनापासून पूजा करते, ती रोग, भय, दुःख आणि संतापापासून मुक्त होते. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.

दुर्गेचे सातवे रूप – कालरात्री
एकवेणी जपाकर्ण पूरा नग्ना खरास्थिता । लम्बोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी । वामपादोल्लसल्लोह लता कण्टक भूषणा । वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी ॥
दुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या देवीचा रंग काळा आहे. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. (Navratri 2023 Kalratri ) कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे, तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खडग (कट्यार) आहे. (Navratri 2023 Kalratri )
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे. परंतु, ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’ सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णतः भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाच्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.

दुर्गामातेचे आठवे रूप – महागौरी
श्वेते वृषे समारूढ श्वेताम्बरधरा शुचिः । महागौरी शुभं ददयान्महादेवप्रमोदया ।।
दुर्गामातेचे आठवे रूप म्हणजे ‘महागौरी’ होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. (Navratri 2023 Kalratri ) महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुवून जातात. भविष्यात पाप-संताप, दुःख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. या गोऱ्यापणाची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. (Navratri 2023 Kalratri)
तिचे वस्त्र आणि आभूषणंदेखील श्वेत रंगाची आहेत. महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.
आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने अंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.

दुर्गेचे नववे रूप – सिद्धीदात्री
या देवी सर्वभूतेषु सिद्धिदात्री रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
दुर्गामातेची नववी शक्ती म्हणजे ‘सिद्धीदात्री’ होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. (Navratri 2023 siddhidatri) अणिमा, महिमा, गरीमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. (Navratri 2023 siddhidatri)
भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने ओळखतात. देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे. देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दुःख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
दुर्गेचे चौथे रूप- कुष्मांडा
सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च । दधाना हस्तपद्माभ्यां कुष्मांडा शुभदास्तु मे ॥
दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ आहे. आपल्या स्मित हास्यातून ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी (Navratri 2023 Kushmanda) असे म्हटले जाते. तिला कुष्मांड (कोहळा) बळी अधिक प्रिय आहे. (Navratri 2023 Kushmanda)
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘अनाहत’ चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिच्या तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भूजा आहेत. ही देवी अष्टभूजा या नावानेही प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांमध्ये क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.
कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगांपासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.
टेकडीवर हिरव्यागार वनराईत वसलेली दुर्गादेवी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील एक हरित परिसर म्हणजे निगडीतील दुर्गादेवी टेकडी. पिंपरी चिंचवडमधील एक शक्तीपीठ. ही टेकडी प्रसिध्द आहे ती दुर्गादेवीमुळे. काय आहे या दुर्गादेवीची कथा जाणून घेऊया-
चारही बाजूंनी असलेला हिरवागार परिसर…अल्हाददायी वातावरण… निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरातील गुफेत असलेली टेकडीवर वसलेली निगडीतील दुर्गा देवी. दुर्गा देवीच्याच नावाने ही टेकडी प्रसिध्द झाली आहे. दुर्गा देवी टेकडी एक पिंपरी-चिंचवड परिसरातील पर्यटन केंद्रच बनले आहे. दुर्गा देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. यापूर्वी या भागात खाणकपारी होती. तेथील देवीची मूर्ती पाहून विनोद शर्मा या भाविकाने देवीची प्राणप्रतिष्ठा करुन मंदिर बांधले. त्यानंतर जेव्हा पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापित झाली तेव्हा त्यावेळी हे मंदिर महापालिकेच्या अखत्यारित आले. तेव्हा भाविक शर्मा यांनी बांधलेल्या या मंदिराची डागडूजी केली. तसेच बाहेरील बाजूने मंदिर आणखी वाढवले. 11 ऑक्टोबर 1982 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. मंदिर परिसर पालिकेच्या अखत्यारित आला. महापालिकेने या टेकडीकडे विशेष लक्ष दिले. 2002 साली मंदिराची पुन्हा डागडूजी करुन मंदिर पुन्हा नव्याने स्थापित करण्यात आले आहे.
जेव्हा पिंपरी-चिंचवड ही नगरपालिका होती त्यावेळी 1976 रोजू दिनेश अब्दुलकर नावाचे कलेक्टर नियुक्त होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या परिसरात वृक्षारोपण मोहिम हाती घेतली. येथील संपूर्ण परिसर हरित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर 1982 मध्ये जेव्हा महापालिका स्थापन झाली होती. त्यावेळी नेमलेले प्रशासक हरनामसिंग यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा अभ्यास केला. त्यानुसार नाशिक फाटा ते एमआयडीसी या परिसरात वृक्षारोपण मोहिम राबवली. त्याचवेळी दुर्गादेवीटेकडीकडे विशेष लक्ष दिले गेले. तेथील परिसर पाहता तेथे काही औषधी आणि काही इतर झाडे लावण्यात आली. त्यामुळे मंदिराचा परिसर हरित झाला आहे. अशी माहितीदुर्गा देवी उद्यानाचे मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांनी दिली.
सन 2002 साली या मंदिराचे ट्र्स्ट प्रस्थापित करण्यात आले. नवरात्रीत मंदिरात अनेक कार्यक्रम घेतले जातात. नऊ दिवस देवीचा गोंधळ, आरती, भजन, पोवाडे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दुर्गादेवी टेकडी हे भाविकांचे श्रध्दास्थान तर आहेच. त्याचबरोबर हे एक पर्यटन स्थळ असल्याने नागरिक नवरात्रात तर येतातच पण इतरही दिवशी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी या परिसरात असते.
दुर्गेचे पहिले रूप : शैलपुत्री

आजपासून (रविवार दि. 15/10/2023) शारदीय नवरात्राला प्रारंभ होत आहे. या नऊ दिवसांत देवीची नऊ रूपात पूजा-अर्चना होते. या नवदुर्गांचे माहात्म्य आजपासून क्रमश: देत आहोत.
दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ या नावाने ओळखले जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले आहे.
या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तिने दक्ष प्रजापती राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव सती असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता. एकदा दक्षाने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही.
सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली. आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे, याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती ‘शैलपुत्री’ या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. ‘शैलपुत्री’ देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.
पालघर जिल्ह्यातील शक्तिपीठ जीवधन गडावरील आई जीवदानी

खानिवडे : विरार शहर रालगत असलेल्या उंच डोंगरावरिल जीवधन गडावर जीवदानी आईचं मंदिर स्थित आहे. कधी काळी या शहराचं नाव एकविरा होतं, असं म्हटलं जातं. त्या काळी या मंदिराला एकविरा देवी या नावानेही ओळखलं जातं होतं. मोगल आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणांत या मंदिराला इजा पोहोचवली गेली होती. त्यावेळी काही स्थानिक लोक या डोंगरावर देवीच्या दर्शनाला येत. त्यांच्याच आस्थेमुळे देवीची महती पुढील पिढीत स्रवत गेली. (Navratri 2023)
देवीचं मंदिर वैतरणा नदीच्या तटावर पर्वतराजींच्या कुशीत वसलेलं आहे. वर्तमान काळात भाविकांत आई जीवदानी देवी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील १८ शक्तीपिठांपैकीही हे एक स्थान असल्याचं सांगितलं जातं. एका पौराणिक कथेनुसार, राजा दक्षाने पूजेदरम्यान देवाधिदेव शंकराचा अपमान केल्याने आदिशक्तीने स्वतः मला अग्रिहोत्रात समर्पित केलं होतं. आदिशक्तीचं हे शरीर शंकर घेऊन जात असताना भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, ती ठिकाणं शक्तीपीठ बनली. जीवदानी हेदेखील त्यापैकी एक स्थान होतं.
या स्थानाबाबत स्थानिक लोकांत अनेक आख्यायिकाही आहेत. त्यातीलच एक आख्यायिका अशी आहे की, येथील एका गावात एक गुराखी होता. याच डोंगराच्या पायथ्याशी तो आपली गुरे चरायला नेत असे. त्याच्या गुरांसोबत आणखी एक गाय चरायला यायची परंतु संध्याकाळ होताच ती गाय नजरे आड होत असे. एक दिवस गायीच्या मालकाच्या शोधात हा गुराखी डोंगरावर गेला….. पण गाय डोंगरावर चढताच दृष्टीआड झाली. त्याचवेळी त्या ठिकाणी एक देवी प्रकट झाली. (Navratri 2023)
देवस्थानाबाबत आख्यायिका
गुराख्याने गाईला चरवण्याच्या बदल्यात देवीजवळ मोबदला मागितला. गुराख्याचं म्हणणं ऐकून घेत देवीने गाय कामधेनु असते. ती तुला मोक्ष प्रदान करेन, याच कथेचा शेवट काही लोक थोडा वेगळ्या प्रकारेही सांगतात. तो असा देवी दृष्टीआड झाली तसा गायीने हृदयविदारक हंबरडा फोडला आणि कड्यावरून स्वतःला झोकून दिले. या बलिदानाचे रहस्य अजून कोणाला उलगडलेले नाही. पण तिने आपल्या जीवाचे दान केलं म्हणून या डोंगराला जीवदानीचा डोंगर व तेथे वास करणारी आदिमाता म्हणून जीवदानी देवी प्रसिद्ध झाली.
नवसाला पावणारी देवी
सौम्य शीतल, प्रसन्न अशा या मूर्तीच्या डाव्या हाती कमलपुष्प आहे. तर उजव्या हाताने माता भाविकांना आशीर्वाद देत आहे. त्यापूर्वी देवीची लाकडी मूर्ती होती. २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये जीवदानी मंदिर ट्रस्टची स्थापना झाली. आजही भाविकांत आई जीवदानीविषयी प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे नवसाला पावणारी देवी म्हणूनही या मंदिराची ख्याती आहे. देशभरातील देवीभक्त या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात. गेल्या काही वर्षांत येथे कायापालट झाला असून असंख्य भाविक दर्शनासाठी येतात.
दुर्गेचे दुसरे रूप : ब्रह्मचारिणी

दधाना कर पद्माभ्यामक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥
नवशक्तींपैकी ‘ब्रह्मचारिणी’ हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. (Navratri 2023 )
या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यावेळी नारदमुनींनी तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा, यासाठी कठोर तपस्या करायला सांगितले होते. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. (Navratri 2023 )
अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले, की ‘हे देवी! तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील,’ असा वर त्यांनी दिला.
ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप आहे.महती नवदुर्गांची : पद्मावतीदेवी (पद्मांबिका)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.
नवदुर्गांतील तृतीय दुर्गा देवी म्हणजेच श्री पद्मावतीदेवी (पद्मांबिका) होय. मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरात या देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती अडीच फूट उंचीची, शेंदूर लावलेली चित्ताकर्षक आहे. श्री विष्णू, नाईकबा, नागराज, हनुमान, सटवाई, गजेंद्रलक्ष्मी, गणेश, अगस्ती लोपामुद्रा, प्रल्हादेश्वर आदी परिवार देवता आहेत.
पद्मा व पद्मालय नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या परिसरात पूर्वी पद्माळे नावाचे तळे होते. येथे भक्त प्रल्हादाने घोर तपश्चर्या करून नृसिंहास प्रसन्न करवून पितृद्रोहाचे पाप नष्ट केले. पापाचा नाश करणारे स्थान, जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान, अनेकांचे कुलदैवत, अंतगृहपालिकेतील आग्नेयेची देवता असा या देवीचा परिचय आहे.
नवरात्रौत्सव २०२३ : सीता : जगन्मातेचंच एक रूप
भूमिकन्या सीता हे जगन्मातेचंच एक रूप. मानवी रूपात प्रकट होऊन जनमानसात जिव्हाळ्याचं स्थान मिळवलेली ही एक अनोखी देवी. छत्तीसगडमध्ये तपस्विनी शबरी आणि सीता-राम-लक्ष्मण यांचं मंदिर आहे. चौदा वर्षांच्या वनवासातील दहा वर्षांहून अधिक काळ हे तिघे छत्तीसगडच्या भूमीत वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्याचे संस्कृत साहित्यातून दिसते. ‘शिवरी नारायण’ या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. प्रादेशिक भाषेनुसार शिवरी म्हणजे शबरी. सीता श्रीरामांची सहधर्मिणी; त्याचबरोबर ती पृथ्वी आणि निसर्गाशी नातं असलेली देवता आहे. वनवासाच्या काळात, ‘विनाकारण जीवहत्या करू नये’ हे सांगणारी सीता वाल्मीकी रामायणात भेटते. ऋग्वेदात भूमीला उद्देशून ‘सीता’ हा शब्द येतो. प्राचीन काळात कृषिविद्येशी संबंधित असणारी ‘सीता’ ही महत्त्वाची देवता होती.
महती नवदुर्गांची : श्री मुक्तांबिका (श्री मुकांबादेवी)
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.
छत्रपती शाहू स्टेडियमच्या दक्षिणेला असणाऱ्या ‘रावणेश्वर’ साठमारीमागे नवदुर्गांतील द्वितीय दुर्गा म्हणजेच श्री मुक्तांबिका देवीचे मंदिर आहे.
मुकांबा देवीचे मूळ स्थान कर्नाटकामध्ये कोल्लूर नावाने प्रसिद्ध आहे. कोलरमध्ये भगवान परशुरामांच्या पूजेतील शिवलिंग होते. येथील स्थान माहात्म्य जाणून तेथे कोलमहर्षी तपश्चर्या करत होते. या परिसरात मुकासुर नावाचा एक राक्षस राहत होता. त्याने कोलमहर्षीच्या तपकार्यात विघ्न आणण्यास सुरुवात केली. त्याच्यापासून बचावासाठी त्यांनी शक्ती मातेची आराधना केली. त्या ठिकाणी गौरीमाता प्रकट झाली आणि तिने मुकासुर राक्षसाचा वध केला. यामुळे देवीला मुकांबा किंवा मुकांबिका हे नाव प्राप्त झाले. या परिसराला ‘कोलूर मुकांबा’ असे म्हटले जाऊ लागले. पुढे या ठिकाणी शंकराचार्य स्वामी आले होते. तेव्हा त्यांना मुकांबिकेचे जसे अधिष्ठान जाणवले, त्याप्रमाणे त्यांनी तेथेच मुकांबा भगवतीच्या मूर्तीची स्थापना करून तिला जागृत केले. भगवान परशुरामांनी स्थापन केलेल्या सात मुक्ती स्थानातील ही देवता आपल्या नवदुर्गाची मोक्षप्रदान करते.
कोल्हापुरातील मुक्तांबिका मंदिरातील देवीची मूर्ती दीड फूट उंचीची काळ्या पाषाणाची चतुर्भुज बैठकी आहे. बाजूच्या दोन हत्तींनी देवीच्या मस्तकावर चवऱ्या धरल्या आहेत. मुक्तांबिका देवीच्या परिवार देवता मुक्तेश्वर महादेव, वराह- नृसिंह-वामन, मत्स्यावतार व कूर्मावतार, भैरवनाथ, काळभैरव आहेत. देवीच्या दर्शनानंतर परिवारदेवतांचे आणि त्यानंतर भैरवनाथ व काळभैरवाचे दर्शन घेण्याचे यात्रेचे स्वरूप आहे.
दुर्गेचे पाचवे रूप : स्कंदमाता
सिंहसनगता नित्यं पद्माश्रित करद्वया । शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ॥
दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. (Navratri 2023 Skandamata) भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावानेही ओळखले जाते. ते देवासुर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. (Navratri 2023 Skandamata)
स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे. त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.
स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांची इच्छा पूर्ण होते. मृत्युलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Navratri 2023 : महासरस्वती
पौराणिक कथांनुसार शुंभ-निशुंभ या दैत्यांनी देवांना पूर्णपणे प्रभावहीन केलं होतं. देवांनी स्वतःचं सामर्थ्य परत मिळविण्यासाठी हिमालय पर्वतावर जाऊन देवी भगवतीची प्रार्थना केली. तेव्हा भगवती म्हणजेच पार्वतीच्या देहातून कौशिकी ही सुंदर देवी निर्माण झाली. निशुंभाने तिला विवाहाची मागणी घातली. तेव्हा देवीने अट घातली की, माझ्यासह युद्ध करून जो जिंकेल, मला तोडीस तोड ठरेल, त्याच्याशी मी विवाह करेन. तेव्हा शुंभ-निशुंभ प्रचंड बळासह युद्धासाठी उतरले. त्यांचा पराभव करण्यासाठी कौशिकी देवीची अंगभूत शक्ती चंडिका प्रगटली. तिने रक्तबीजाला नेस्तनाबूत करून शुंभ-निशुंभांना पराभूत केले. त्या चंडिका शक्तीलाच महासरस्वती म्हटलं जातं. भारतात विविध ठिकाणी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, अशा तिन्ही मूर्ती एकाच पीठावर स्थापन केलेल्या पाहायला मिळतात.
नवरात्रौत्सव २०२३ : काली
नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस असतो, त्याचं कारण दुर्गेचा महिषासुरावरचा विजय, तिचं अदम्य शौर्य आणि तिच्या नऊ अवतारांचं स्मरण. तसंच नऊ या क्रमांकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यास ‘ब्रह्म संख्या’ असं म्हणतात.
काली हे देवीचे उग्र रूप आहे. पश्चिम बंगाल तसेच शाक्त संप्रदायाचा प्रभाव असलेल्या ठिकाणी कालीची उपासना आढळते. ‘श्यामा रहस्य’ नावाच्या ग्रंथात कालीचे म्हणजेच श्यामाचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘तिचं शरीर काजळाच्या पर्वताप्रमाणे आहे; मुख कराल आहे; ओठावर मंद स्मित आहे; एका हाती रक्ताचे थेंब ठिपकत असलेले नरमुंड आहे; दुसऱ्या हातात तलवार आहे; अन्य दोन हात अभय आणि वरद मुद्रांमध्ये आहेत. तिचा एक पाय शिवांच्या छातीवर आहे. हे सारे शब्द कालीचे संहार आणि सर्जनाचे पैलू दाखवतात. मृत्यू हे प्रत्येकाचे अंतिम वास्तव आहे; पण त्यामुळे नव्या, कोवळ्या अंकुरांना स्थान निर्माण होते. ध्यानस्थ शिवांच शक्ती आहे. तिची जीभ मुखातून बाहेर आलेली असते. त्याचेही स्पष्टीकरण काही बंगाली संदर्भामध्ये फार मनोरमपणे मांडले आहेत. रणमत्त, उग्र कालीचा पाय चुकून शिवांना लागला, त्यामुळे तिनं स्त्रीसुलभ संकोच वाटल्यामुळे जीभ बाहेर काढली. कालीच्या रुद्र रूपातील हेच तर सौंदर्य आहे.
नवरात्रौत्सव २०२३ : चामुंडा
चामुंड दैत्याचा वध जिने केला ती म्हणजे अष्टभुजा चामुंडादेवी होय. हे देवीचे उग्र रूप आहे. चामुंडादेवीचे शिल्प पाहिले असता दिसून येते की, तिच्या हातात खट्वांग आहे; तिचा देह शुष्क आहे; डोळे खोल आहेत; गळ्यात मुंडमाला आहे. तिचे वाहन आहे घुबड हा पक्षी. त्यामागे अर्थातच तत्त्वचिंतन आहे. घुबड हा पक्षी निशाचर आहे. उडताना त्याच्या पंखांचा आवाज होत नाही. शेतीसाठ उपद्रव करणारे जीव हे त्याचे भक्ष्य आहे; मग तो चामुंडेबरोबर कसा? कारण असे आहे की, तो माणसाला नीतीच्या मार्गाने जायचे आवाहन करतो.
अन्यायाने संपत्ती कमवू नये, असे सांगतो. भक्ष्यावर झेप घेताना त्याच्या पंखांचा अजिबात आवाज होत नाही. तसेच यमाचे दूतही तुमच्या मागे चाहूल न देता येऊन उभे राहू शकतात, याची तो आठवण करून देतो. भोगांमध्ये रमलेली माणसे म्हणजे वैचारिक अंधारात जगणारी माणसे; पण घुबड मात्र अशा रात्री जागे असते; निरासक्त असते. भारतीय चिंतन पद्धतीत देवता कल्पना आणि जीवसृष्टी यांना किती विचारपूर्ण पद्धतीने गुंफून टाकलेले आहे, त्याचे हे एक उदाहरण आहे.
दुर्गेचे तिसरे रूप : चंद्रघंटा

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
दुर्गेच्या तिसर्या शक्तीचे नाव ‘चंद्रघंटा’ आहे. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातांमध्ये खडग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.
माता चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेच्या आवाज पे्रतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होेते. आवाजात मधुरता येते. माता चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.
Navratri 2023 : क्षेमंकरी दुर्गा
दुर्गेची सौम्य, कल्याणकारक जी रूपे आहेत, त्यामधील एक म्हणजे क्षेमंकरी दुर्गा हे होय. (Navratri 2023 : क्षेमंकरी दुर्गा) क्षेम म्हणजे कल्याण करणारी दुर्गा. शाक्त आगम ग्रंथांमध्ये जी नवदुर्गा संकल्पना मांडली गेली होती, त्यातील एक रूप क्षेमंकरी दुर्गा होय. (Navratri 2023 : क्षेमंकरी दुर्गा) ‘रूपमण्डन’ नावाच्या संस्कृत ग्रंथात तिच्या वर्णनाचा श्लोक आढळतो, तो असा :
“वरं त्रिशूलं पद्मं च पानपात्रं करे तथा । क्षेमङ्करी तदा नाम क्षेमारोग्यप्रदायिनी ॥”
याचा अर्थ असा की, ‘क्षेमंकरी ही दुर्गा कल्याण करणारी आणि आरोग्य देणारी आहे. तिचा एक हात आशीर्वाद देणारा म्हणजे वरद मुद्रेत असतो. अन्य तीन हातांमध्ये ती त्रिशूळ, कमळ आणि पेयपात्र धारण करते.’ अन्य काही मूर्तीमध्ये तिला दशभुजा रूपातही दाखविले जाते.
दुर्गेचे सहावे रूप : कात्यायनी
चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूल वरवाहना। कात्यायनी शुभं ददयाद्देवी दानव घातिनी ।।
दुर्गेचे हे सहावे रूप ‘कात्यायनी’ या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. (Navratri 2023 Katyayani ) परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. (Navratri 2023 Katyayani )
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले, यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्षे भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.
काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता.
सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता, अशी ही कथा पुराणात आहे.
कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेज:पुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीच्या उजव्या अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते. तो ईहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव होतो. जी व्यक्ती मातेची मनापासून पूजा करते, ती रोग, भय, दुःख आणि संतापापासून मुक्त होते. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.
तोरणागडावर विजेचा लखलखाट; ऐतिहासिक नवरात्रोत्सवात साज

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दुर्गम तोरणागडावर नवरात्रोत्सवात अखेर विजेचा लखलखाट झाला आहे. प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गडावरील शिवकालीन श्री मेंगाईदेवी मंदिरात विद्युतीकरण करण्यात आले आहे. आकर्षक विद्युतरोषणाईने ऐन नवरात्रोत्सवात मंदिर व गडाचा परिसर उजळून निघाला आहे. शिवकालीन नवरात्रोत्सवाला प्रथमच यंदा ऐतिहासिक साज आला आहे.
ऐन नवरात्रोत्सवात गडावर विजेचा लखलखाट झाल्याने पर्यटकांसह भाविकांची गैरसोय दूर झाली आहे. गडाच्या परिसरात दोन वर्षांपासून विद्युतीकरण झाल्याचा डिंगोरा पिटविण्यात आला. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, महावितरण व पुरातत्त्व विभाग ठप्प पडल्याने तोरणागडावरील शिवकालीन श्री मेंगाई मंदिरासह सर्व ऐतिहासिक वास्तू, स्थळे अंधारातच होती.
विद्युतीकरणाचा गाजावाजा करण्यासाठी गडाच्या हनुमान बुरुजावर एक दिवा लावला होता. नवरात्रोत्सवानिमित्त गडावर वीजपुरवठा करण्यासाठी वेल्हे येथील ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांना साकडे घातले. त्याची दखल घेत जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण शिंदे, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. टी. राठोड आदींनी वीज पुरवठ्यासाठी पाठपुरावा केला.
उपविभागीय अभियंता नवनाथ घाटुळे यांनी बुरुजापासून मंदिरापर्यंत जवळपास एक किलोमीटर अंतराची केबल उपलब्ध करून दिली. वेल्हे येथील शाखा अभियंता विनोद थाटे, संतोष शिंदे, कर्मचारी गणेश शिंदे, अमोल डांगे, संदीप दर्डीगे, पुरातत्व खात्याचे पहारेकरी दादू वेगरे आदींनी परिश्रम घेत घटस्थापनेपूर्वी मंदिरात वीजपुरवठा केला.
वेल्हेचे माजी उपसरपंच सुनील राजिवडे म्हणाले, ’गडावरील विद्युतीकरण करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी यानिमित्ताने अखेर पूर्ण झाली आहे.’ माजी उपसरपंच सुनील राजीवडे, प्रदीप मरळ, मालवलीचे माजी सरपंच मंगेश कोडातकर, विकास कदम, संतोष गायके, तानाजी राजावडे, गणेश भुरुक यांच्यासह ग्रामस्थांनी विद्युतकरणासाठी परिश्रम घेतले.
गडाच्या बुरुजापासून श्री मेंगाई मंदिरांसह ऐतिहासिक वास्तू, प्रवेशद्वाराच्या परिसरात विद्युतीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी कार्यवाही सुरू आहे.
-डॉ. विलास वाहणे, सहसंचालक,
पुरातत्त्व विभाग
शिवरायांची मोहरांची माळ वाढवतेय तुळजाभवानीच्या खजिन्याचे ऐश्वर्य
तुळजाभवानी मातेचा खजिना नेहमीच चर्चेत असतो. या खजिन्यात पुरातन काळापासून भर पडत आली आहे ती सोने, मौल्यवान दागिने, अलंकारांच्या रुपाने. अशा खास दागिन्यांची वर्गवारी करुन मंदिर संस्थानने सात पेट्यात ठेवली आहेत. यातील एक नंबर पेटीत अतिप्रचिन व शिवरांयाची नाव असलेली मोहरांची माळ आहे. पहिल्या पेटीतील आणि सहा नंबरच्या पेटीत असलेल्या दागिन्यांचा वापर वर्षभरातील सात पूजांवेळी केला जातो, असे तुळजा भवानीचे पुजारी अमर कदम – परमेश्वर यांनी सांगितले आहे.

छत्रपती घराण्याचे तुळजाभवानी मातेशी श्रध्देचे नाते ऐतिहासिक आणि अतूट आहे. इतिहासात नोंद असलेल्या अनेक घटना याची साक्ष देतात. दरम्यान, देवीच्या खजिन्यात छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेली १०१ मोहरांची माळ खजिन्याचे ऐश्वर्य वाढवत आहे. या खजिन्यात हरपर रेवड्यांची माळ, बिंदी, बीजवरे, मुकूट, मोत्यांचे तुरे, कानजोड, शिरपेच, वेणी, डोक्याची फुले, नेत्रजोड, जडावा, कंबरपट्टा, सोन्याचे हात आदी दागिने आहेत.
‘या’ सात विशेष पूजा
तुळजाभवानी मातेच्या चैत्र शुध्द प्रतिपदा, शिराळशष्टी, भाद्रपद शुध्द अष्टमी, ललितापंचमी, बलिप्रतिपदा, मकर संक्रांत आणि रथसप्तमी या पुजांसाठी या प्राचिन दागिन्यांचे अलंकार देवीला घातले जातात तुळजाभवानीच्या खजिन्यात १०१ मोहरांची शिवछत्रपतींचे नाव
असलेली माळ अनमोल असून ती ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची आहे. सर्व मोहरांचे
प्रत्येकी वजन १० ग्रॅम आहे. लाल दोर्यात गुंफलेली माळ दोन पदरी असून एका
पदरात ४९ व दुसर्या पदरात ५२ मोहरा आहेत. या मोहरांच्या एका बाजूला श्री.
जगदंबा प्रसन्न व दुसर्या बाजूला श्री. राजा शिवछत्रपती असे कोरलेले आहे.
– प्रा. डॉ. सतीश कदम, (ज्येष्ठ इतिहास संशोधक, तुळजापूर)केवळ दोन पेट्यांतीलच दागिने पुजेवेळी बाहेर काढण्यापेक्षा वर्षभरातील
इतर पुजांवेळी उर्वरीत पाच पेट्यांतील दागिनेही मंदिर संस्थानने बाहेर
काढावेत. तेही देवीला घालावेत. त्यामुळे भाविकांनाही देवीच्या या प्राचिन
दागिन्यांचे दर्शन होईल.
– अमर कदम – परमेश्वर, (तुळजाभवानीचे पुजारी, तुळजापूर)
दुर्गेचे सातवे रूप - कालरात्री
एकवेणी जपाकर्ण पूरा नग्ना खरास्थिता । लम्बोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी । वामपादोल्लसल्लोह लता कण्टक भूषणा । वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी ॥
दुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या देवीचा रंग काळा आहे. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. (Navratri 2023 Kalratri ) कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे, तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खडग (कट्यार) आहे. (Navratri 2023 Kalratri )
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे. परंतु, ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’ सुद्धा आहे. यामुळे भक्ताने भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे. या देवीचे भक्त पूर्णतः भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाच्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.
दुर्गेचे पाचवे रूप : स्कंदमाता

सिंहसनगता नित्यं पद्माश्रित करद्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी॥
दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावानेही ओळखले जाते. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.
स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे. त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.
स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
नांदगावचे ग्रामदैवत एकवीरा देवी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; नांदगावचे ग्रामदैवत असलेल्या एकवीरा देवीचे मंदिर शाकंभरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. जागृत आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी, अशी या मंदिराची ख्याती आहे. सतराव्या शतकात ब्रम्हानंद महाराज यांना देवीचा दृष्टांत झाला आणि पेशव्यांच्या मदतीने त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते.
संपुर्णपणे आखीव रेखीव दगडांमध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून, आजही मंदिर भक्कम स्थितीत उभे आहे. मंदिरासमोरच तीस फुट उंचीची दगडी दीपमाळ आणि त्याखाली असलेलं श्रीगणेशाचं एक छोटस मंदिर आहे. दर्शनाला जाण्यापूर्वी गणरायाचे दर्शन होते आणि त्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश होतो. बाजूलाच रेणुका माता आणि श्री गणेशाची मूर्ती आहे. या मंदिराला दोन घुमट आहेत. दुसऱ्या गाभाऱ्यात एकवीरा देवीची स्वयंभू मूर्ती आहे. दगडाची मूर्ती पूर्वी शेंदूरचर्चित होती जिचा नंतर जिर्णोद्धार झाला. अकरा फूट उंच असलेली ही मूर्ती सप्तशृंगी निवासिनी देवी प्रमाणेच आहे. देवीला अठराभुजा असून तिच्या प्रत्येक हातात विविध प्रकारचे शस्त्र आहेत. चैत्रोत्सव काळात आणि शारदीय नवरात्रोत्सव काळात येथे यात्रा भरते. नवरात्रोत्सवात महिला भाविक नऊ दिवस घटी बसवतात. नवसाला पावणारी एकवीरा देवी ग्रामदेवतेवर येथील भाविकांची अपार श्रध्दा आहे.
दुर्गेचे सहावे रूप : कात्यायनी

चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूल वरवाहना ।
कात्यायनी शुभं ददयाद्देवी दानव घातिनी॥
दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. परिपूर्ण आत्मदान करणार्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्षे भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.
काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता, अशी ही कथा पुराणात आहे.
कात्यायनी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेज, पुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीच्या उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दुःख आणि संतापापासून मुक्त होतो. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.
दुर्गेचे नववे रूप - सिद्धीदात्री
या देवी सर्वभूतेषु सिद्धिदात्री रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ दुर्गामातेची नववी शक्ती म्हणजे ‘सिद्धीदात्री’ होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. ( Navratri 2023 siddhidatri )
अणिमा, महिमा, गरीमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. ( Navratri 2023 siddhidatri )
भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने ओळखतात. देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे. देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दुःख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
परभणी : भोगावची नवसाला पावणारी जगदंबा
Published on: October 18, 2023, 12:54 PM

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या भोगाव येथे संपूर्ण मराठवाड्यातून भाविक नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी येतात. संस्थानच्या वतीने या ९ दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते.
शहरापासून १० कि.मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात तुळजाभवानी देवीचे हेमाडपंती मंदिर आहे. भोगाव देवीची ओळख नवसाला पावणारी देवी अशी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील भाविक या ठिकाणी आपला नवस बोलण्यासाठी येतात. या देवीच्या मंदिरात सनई-चौघडा, ढोलताशांच्या निनादात आई जगदंबेचा जयघोष करीत नवरात्र उत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. नवरात्र महोत्सवात दररोज काकडा आरती, नित्य उपासना, रुद्राभिषेक, श्री सुक्त अथर्वशीर्ष सहस्त्रनाम पाठ, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या देवी संस्थानचा कारभार मोरे-देशमुख घराण्याकडे आहे. या घराण्याकडे देवीची पूजा, आरतीचा मान आहे. रविवारी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. देवीचा जागर म्हणून अष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन केले जाते. त्याच दिवशी मध्यरात्री होमहवन केले जाते. नवमीच्या दिवशी कोहळ्याची पुर्णाहूती दिली जाते. त्यानंतर काही काळ देवीचे दर्शन बंद असते. सायंकाळी देवीची पालखी निघते. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाने नवरात्र उत्सवाची सांगता होते. भाविकांची इच्छा पूर्ण करणारी अशी भोगाव देवीची ओळख आहे.
Navratri 2023: अर्नाळा किल्ला येथील प्राचीन कालीन कालिका माता मंदिर
विरार पश्चिमेच्या अर्नाळा किल्ल्यातील प्रसिद्ध कालिका देवी मंदिरातही घटस्थापना करून जागर सुरू करण्यात येत आहे.
Updated:

कल्पेश भोईर, लोकसत्ता
वसई: विरार शहरात ही शारदीय नवरात्री उत्साचा जल्लोष सुरू आहे. विशेषतः या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने शहरातील देवी देवतांच्या प्राचीन कालीन मंदिरात जागर करण्यात येत आहे. विरार पश्चिमेच्या अर्नाळा किल्ल्यातील प्रसिद्ध कालिका देवी मंदिरातही घटस्थापना करून जागर सुरू करण्यात येत आहे. विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला हे ऐतिहासिक परिसर आहे. या भागात अनेक वर्षे जुने प्राचीन कालीन कालिका देवीचे मंदिर आहे. सध्या ज्या ठिकाणी मंदिर आहे ती पुर्वी मराठ्यांनी तयार केलेली सागरी जेट्टी होती असे काही इतिहास अभ्याकांचे मत.
जंजिरे अर्नाळा -अर्नाळा गावाविषयी संबंध पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे ती अशी..जंजिरे अर्नाळा गाव हे सीतमातेचं माहेरघर आहे आणि जोपर्यंत सीतामाईचा या गावावर वरदहस्त आहे तोपर्यंत कुठलीही नैसर्गिक -मानव निर्मित आपत्ती या गावाला ठेच पोहचू शकली नाही याबाबत तसा कोणताही पुरावा नसला तरी आजही असंख्य वादळे, सुनामी लाटा यांचा कधी त्रास झाला नसल्याचे येथील गावकरी सांगतात. विशेषतः या भागात मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव राहत असून या बांधवांची ग्रामदेवता म्हणून कालिका माता प्रसिद्ध आहे.
मागील काही वर्षांपासून या देवीची प्रसिद्धी अधिकच वाढू लागली आहे. मंदिरात जाण्यासाठी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरून बोटीत बसून अर्नाळा किल्ला असा प्रवास करावा लागतो. या मंदिरात शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजूबाजूच्या गावकऱ्यांसह इतर भागातून मोठ्या संख्येने भाविक भक्त या मंदिराला भेट देतात. मंदिरात नऊ दिवस पूजा पाठ, आरती यासह इतर कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. याच भागात ऐतिहासिक जंजिरे अर्नाळा किल्ला सुद्धा असल्याने आपसूकच अनेक भाविक भक्त व पर्यटक यांचा ओढा अधिक असतो.
दसऱ्याला कालिका मंदिरात सर्वाधिक गर्दी
अर्नाळा किल्ल्यातील कालिका मातेच्या मंदिरात दसऱ्याला पालघर जिल्ह्यातील विविध गावातील कोळी बांधव कुटुंबासह बोटी घेऊन देवीच्या दर्शनासाठी येतात. नारळीपौर्णिमेप्रमाणेच दसरा हा सुद्धा येथील कोळी बांधवांचा मोठा सण आहे. त्यामुळे दसऱ्याच्या या मंदिर परिसर अगदी भक्तीमय व आनंददायी वातावरण असते. २० ते २५ वर्षांपूर्वी दातिवरे कोरे, एडवण गावातील भाविक आपल्या बोटी तारवे घेऊन देवीच्या दर्शनासाठी येत असत त्यावेळेस संबंध बंदर बोटीने फुलून जात असे. काळ बदलला आणि कोळी बांधव ही नोकरी धंद्याला लागला त्यामुळे ही लोक आजही बोटीने येत नसले तरी आपली देवीच्या दर्शनाला येण्याची परंपरा आजही जपून आहेत.
नवरात्रीनिमित्त यंदा मुंबईतील देवींच्या ‘या’ ९ प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या!
Navratri Festival 2023 : हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना केली जाते. यानंतर पुढील नऊ दिवल दुर्गा मातेच्या विविध रुपांची मनोभावे पूजा- अर्चा, व्रत केले जाते. महाराष्ट्रातील अनेक देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत, जिथे नवरात्रोत्सव काळात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. पण प्रत्येकाला या मंदिरांत जाऊन दर्शन घेणे शक्य नसते. अशावेळी मुंबईकर कामातून वेळ काढत मुंबईतील प्रसिद्ध आणि प्राचीन देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. यामुळे आपण नवरात्रीनिमित्त मुंबईतील प्राचीन आणि प्रसिद्ध नऊ देवींच्या मंदिरांबद्दल जाणून घेऊ… (Shardiya Navratri 2023)
मुंबईतील देवीची ९ प्रसिद्ध मंदिरे (Famous Mata Temples In Mumbai)
१) मुंबादेवी मंदिर, भुलेश्वर
मुंबईची ग्रामदैवता अशी मुंबादेवीची ओळख आहे. दक्षिण मुंबईतील काळबादेवी, भुलेश्वर परिसरात मुंबादेवीचे मंदिर आहे. हे मंदिर मुंबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. याच देवीच्या नावावरुन मुंबईचं नामकरण झालं आहे. एकेकाळी या मंदिराचा परिसर मोठी बाजारपेठ होती. तेव्हा येथील काही कोळी बांधवांनी मिळून या मंदिराची स्थापना केली. समुद्रापासून मुंबादेवी मुंबईचे रक्षण करते अशी कोळी बांधवांची आस्था आहे. त्यामुळे मुंबईतील कोळी समाजाची मुंबादेवी आराध्य दैवत मानली जाते.
२) महालक्ष्मी मंदिर, मुंबई सेंट्रल
मुंबईतील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे महालक्ष्मी मंदिर. या मंदिरामागेही मोठा इतिहास आहे. १८३१ मध्ये धाकजी दादाजी या हिंदू व्यापाऱ्याने हे मंदिर उभारलं. यानंतर १७८५ या मंदिरात देवीची स्थापना झाली, याशिवाय मंदिरात त्रिदेवी देवी महाकाल, महालक्ष्मी आणि महासरस्वती देवींच्या मूर्त्या आहेत. या मंदिरात नवरात्रोत्सव काळात दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात.
३) प्रभादेवी मंदिर, प्रभादेवी
मुंबईतील देवीच्या सर्वात प्राचीन मंदिरांमध्ये प्रभादेवी मंदिराचे नाव घेतले जाते. या मंदिराला ३०० वर्षांचा असा इतिहास आहे. दादरजवळील प्रभादेवी येथे हे मंदिर असून मंदिरातील देवीची मूर्ती १२ व्या शताब्दीची आहे. या मंदिराला प्रभावती देवी मंदिर या नावेही ओळखले जाते. प्रभादेवी मंदिरातील मुख्य देवता असलेल्या देवीला शाकंभरी देवी म्हटले जाते. या मंदिरामागेही मोठा इतिहास आहे. नवरात्रोत्सव काळात दादर, प्रभादेवी परिसरातील अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.
४) शीतलादेवी मंदिर, माहिम
मुंबईतील माहिम परिसरात असलेल्या एकमेव असं देवीचे मंदिर जिथे विविध धर्माचे लोक दर्शनासाठी येतात, हे मंदिर म्हणजे शीतलादेवी मंदिर. या मंदिरालाही ३०० वर्षांचा इतिहास आहे. या मंदिरातील शितला देवीची मूर्ती स्वयंभू असून जी कोळी बांधवांना सापडली होती. यामुळे कोळी बांधवांसह पाठारे प्रभु , सूर्यवंशी, आगरी समाज आणि राजस्थानी समाजाची ही कुलदेवता मानली जाते. या मंदिर परिसरात तुम्हाला हनुमान, गणेश, शांता दुर्गा त्रिमूर्ती काली, विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरांचे दर्शन घेता येते. तसेच खोकला बरा करणाऱ्या खोकला देवीचेही मंदिर आहे. नवरात्रीत भाविकांची याठिकाणी मोठी गर्दी असते.
५) सात आसरा मनमाला मंदिर, माहीम
मुंबईतील माटुंगा परिसरात सात आसरा मनमाला देवीचे मंदिर आहे. ही देवी माहिम, माटुंग्याची ग्रामदेवता मानली जाते. नवरात्रीनिमित्त १९७१ पासून मंदिरात देवीची उत्सव मूर्ती बसवण्यात आली आहे. दोनशे वर्षांचा इतिहास असलेले हे मंदिर आहे. पूर्वी येथे एक तलाव होते त्या तलावाचे नाव होते मनमाला, त्याच नावावरून या देवीचे नाव ठेवण्यात आले असे येथील स्थानिक सांगतात. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची सात स्वयंभू मुर्त्या आहे. यात खोकला देवी, शीतला देवी, मनमाला देवी, केवडावती देवी, चंपावती, जरीमरी, संतोषी देवीचा समावेश आहे.या सातही देवींमुळे या मंदिराला सात आसरा मनमाली देवी म्हणून संबोधले जाते.
६) काळबादेवी मंदिर, काळबादेवी
मुंबईतील सर्वात जुन्या आणि मुख्य बाजारापेठ असलेल्या काळबादेवी परिसरात काळबादेवीचे मंदिर आहे. या मंदिरामागेही ३०० वर्षांचा इतिहास आहे. मंदिरातील महाकालिमातेची मूर्ती काळबादेवी म्हणून ओळखली जाते. यातील देवीची मूर्ती जवळपास ५०० वर्षे जुनी आहे. या मंदिरात आजही अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात देवीच्या दर्शनासाठी भक्तगण दूरवरुन येत असतात.
७) जीवदानी माता मंदिर, विरार
विरार रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या डोंगरावर जीवदानी मातेचे मंदिर वसले आहे. जे अत्यंत प्राचीन आहे. या मंदिराची निर्मिती पाच पांडवांनी वनवासात असताना केली अशी आख्यायिका सांगितली जाते. येथील वीरा गुहेत पांडवांनी देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जाण्यासाठी भक्तांना जवळपास १३०० पायऱ्या चढाव्या लागतात. नवरात्रोत्सव काळात या मंदिरातील देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते.
८) गोल्फादेवी मंदिर, वरळी
मुंबईतील वरळी परिसरात उंच टेकडीवर वसलेले गोल्फादेवीचे मंदिर कोळी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात गोल्फादेवीसह साकबादेवी व हरबादेवीचीही मूर्ती आहे. या देवाच्या मंदिरात कौल लावण्याची प्रथा पार पूर्वापार चालत आली आहे. देवीच्या तिनही मूर्ती पाषणाच्या आहेत. नवरात्रोत्सव काळात कोळी बांधवांसह मुंबईतील अनेक भक्तगण दर्शनासाठी या मंदिरात येतात.
९) हरबादेवी मंदिर, विरार
विरारमधील टाटोळे तलावाच्या परिसरातील हरबादेवी मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिराची स्थापना १८६० साली झाली. या मंदिरातील मूर्तीची स्थापन बैरागी घराण्याने केली आहे. स्थानिक मराठी समुदायात ही हरबादेवी म्हणून ओळखली जाते तर गुजराती समुदायात ही शीतलादेवी म्हणून प्रसिद्ध आहे.
अशाप्रकारे मुंबईत देवीची इतरही प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरं आहे, जिथे नवरात्रोत्सावादरम्यान भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. असा काही मंदिरांबद्दल तुम्हाला ठावूक असल्यास आम्हाला कमेंट्स करुन सांगा.
भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील?
भारतीय संस्कृतीत पुरुष देवतांपेक्षाही अंमळ अधिक महत्त्व मातृशक्तीच्या उपासनेला आहे. देवीच्या नानाविध रूपांनी भारतीय श्रद्धा परंपरा व्यापलेल्या आहेत. याच देवीच्या अनेक रूपांमधील थोडेसे वेगळे रूप लज्जागौरीच्या रूपात आढळते. या देवीच्या भिन्न स्वरूपामुळे तिला ‘विचित्रा देवी’ असे ही संबोधले जात होते. पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे या देवीच्या प्रतिमांची भरभराट इसवी सन दुसऱ्या ते अकराव्या शतकात अधिक झाली असे दिसते.
लज्जागौरी ही मातृदेवता आहे. सृजनाची देवता म्हणून साऱ्या भारतात तिची
उपासना वेदपूर्व काळापासून चालू होती. या शक्ती परंपरेचा नेमका उगम कधी
झाला. या प्रश्नाचे उत्तर मानवी उत्क्रांतीत सापडते. जगातील कुठलाही प्रदेश
असो, मानवी उत्क्रांतीच्या प्रथम टप्प्यात मानवाने त्याला वाटलेल्या
अकलनीय घटनांना देवत्त्व दिले. या प्रक्रियेत त्याच्या दृष्टीस पडलेला
चमत्कार म्हणजे ‘जन्म’ आणि ‘मृत्यू’. जन्म स्त्री पासून होतो.. ही बाब
नक्कीच मानवा करिता कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हती. यातूनच त्याने
मातृपूजनाला सुरुवात केली. आणि यातून लज्जागौरीच्या प्रतिमा पूजनास प्रारंभ
झाला, असे अभ्यासक मानतात. भारतातील या मातृपूजनाचे सर्वात जुने पुरावे
इसवी सन पूर्व ९००० या कालखंडातील आहेत.
१४ मजली इमारती एवढा उंच आहे ‘हा’ राजा! जगातील सर्वोच्च गणपतीच्या मूर्तीची ‘ही’ झलक पाहून व्हाल मंत्रमुग्ध
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठवाड्यात तगरपूर येथे उत्खननात याच आगळ्या वेगळ्या देवीच्या प्रतिमा समोर आल्या. या प्रतिमा भाजलेल्या सपाट मुद्रेवर तयार केलेल्या आहेत. या प्रतिमांमध्ये देवीच्या नाभी प्रदेशापासून खालील भागाचे अंकन केलेले असते. या प्रतिमा नग्न असतात. योनीला उत्फुल्लता येण्यासाठी लज्जागौरी या देवीच्या प्रतिमेत दोन्ही पाय बाजूला गुडघ्यात वाकलेले दाखवलेले असतात, काही वेळेस शरीर झुकलेले असते, शिरहीन प्रतिमा असते, ही मूर्ती प्रामुख्याने योनी किंवा गर्भाचे प्रतिनिधित्व करते. या देवीच्या मूर्ती योनी या मातृदर्शक इंद्रियांना उठाव देणाऱ्या आहेत.
आणखी वाचा: भारतीय संस्कृतीत रजस्वला देवीची उपासना सर्वश्रेष्ठ का मानली जाते? आणि कुठे?
कॅरोल रॅडक्लिफ बोलोन (आर्थर एम सॅकलर गॅलरी आणि फ्रीर गॅलरी ऑफ आर्टमधील दक्षिण आणि आग्नेय आशियाई कलेच्या माजी सहाय्यक क्युरेटर) यांनी आपल्या Forms of the Goddess Lajjā Gaurī in Indian Art या १९९२ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात लज्जा गौरीच्या प्रतिमांविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यांच्या संशोधनानुसार, लज्जा गौरीच्या प्रतिमा भारतात मुख्यतः कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र येथे मोठ्या आढळून आलेल्या आहेत. विशेषत: तेर, नागपूर, कोंडापूर, कौसंबी आणि भिटा या ठिकाणी सापडलेल्या प्रतिमांचे महत्त्व अधिक आहे. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे भारतातील लज्जा गौरी प्रतिमा तयार करण्यासाठी प्रामुख्याने दोन पद्धतींचा वापर केला जात असे, एक म्हणजे मातीच्या साहाय्याने किंवा दगडात कोरलेल्या हाताने बनविलेल्या प्रतिमा असतात तर दुसऱ्या पद्धतीत साच्याचा वापर केलेला असे.
या अशा प्रकारच्या प्रतिमांचा उद्देश काय होता?
अभ्यासकांच्या मते देवीची ही प्रतिमा प्रजननाशी संबंधित आहे. बहुतांश प्रतिमा या पाण्याच्या स्त्रोतांजवळ सापडल्या असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्राचीन कलेमध्ये स्त्री शरीरशास्त्र बहुतेक वेळा “मातृदेवते”च्या संदर्भात अगदी सहजतेने स्पष्ट केले जाते, लज्जा गौरीची वैशिष्ट्ये बाळंतपणाशी संबंधित आहेत. भारतात या देवीच्या अनेक प्रतिमा सापडत असल्या तरी, या देवीविषयी प्रतिष्ठित ग्रंथांमध्ये संदर्भ आढळत नाहीत. या मूर्तीचे मूलतः वैशिष्ट्ये म्हणजे योनीच्या दर्शनाला उठाव देण्यासाठी पाय गुडघ्यात दुमडून बाजूला दाखविलेले असतात. या प्रतिमांमध्ये शीर मुद्दाम दाखविलेले नसते. खांद्यांपासून खालच्या भागाचे अंकन केलेले असते. आलंपूर, महाकूट, भीटा येथे सापडलेल्या प्रतिमांमध्ये शिराच्या जागी कमळ दाखविलेले आहे. तर तेर येथे मिळालेल्या एका प्रतिमे बरोबर वृषभ दर्शविलेला आहे.
आणखी वाचा: करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा निस्सीम भक्त हुतात्मा मुतय्या शिलालेखातून अजरामर!
दक्षिण आशियाई कलेच्या अमेरिकन इतिहासकार स्टेला क्रॅम्रिश यांनी लज्जा गौरीवरील त्यांच्या १९५७ सालच्या शोधनिबंधात, अदितीच्या उत्तानपादा प्रतिमेचे वर्णन केलेले आहे. असे असले तरी या देवीच्या प्रतिमेतील ही अवस्था नेमकी बाळंतपणातील किंवा लैंगिक अवस्थेतील आहे हे सांगणे कठीण असल्याचे काही अभ्यासक मानतात. क्युरेटर रॉबर्ट एल ब्राउन (प्राध्यापक, UCLA ) यांनी नमूद केले आहे की, या देवीच्या प्रतिमा पुरुष जोडीदारांशिवाय दिसतात, कलाकाराचा हेतू लैंगिक कृतीचे सादरीकरण नसून योनीचे प्रदर्शन किंवा मातृत्त्व दर्शविणे हा आहे. बोलोन यांनी महाकूट मंदिराच्या संकुलात ..लज्जागौरी नावाने देवी पार्वतीची काहीशी कुप्रसिद्ध आणि अत्यंत अशोभनीय डोके नसलेली दगडी आकृती असल्याचे वर्णन केले आहे. प्रसिद्ध पुरातज्ञ एच.डी. संकलिया यांनी त्यांच्या १९६० सालच्या शोधनिबंधाच्या शीर्षकातच लज्जा गौरी या नावाचे भाषांतर “निर्लज्ज स्त्री” असे केले आहे. सांकलिया यांच्या मते बौबो नामक विदेशी देवता इजिप्तमधून रोमन संपर्काच्या काळात भारतात आली, ती म्हणजे लज्जागौरी.
प्रसिद्ध अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी नमूद केल्याप्रमाणे महाकूट आणि सिध्दनकोट्टे येथे लज्जागौरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या देवीची उपासना स्त्रिया संतान प्राप्तीच्या हेतूने करतात. वंधत्व असलेल्या स्त्रिया संततीप्राप्तीसाठी महाकुटाच्या देवीला नवस करतात, अशी माहिती देवीकोशकारांनी दिली आहे. तर सिध्दनकोट्टे येथे स्त्रिया देवीच्या योनीला आणि स्तनांना लोणी आणि शेंदूर लावून आपली कूस उजविण्यासाठी देवीची प्रार्थना करतात. नागार्जुनीकोंडा येथे अशाच स्वरूपाची देवीची संगमरवरी प्रतिमा मिळाली आहे. ज्यावर अभिलेख कोरलेला आहे. ती मूर्ती इक्ष्वाकूवंशीय राजा नेहवाल शंतमूल याची पत्नी खंदुवुला या ‘जीवत्पुत्रा आणि अविधवा’ स्त्रीने करविले, असे ब्राह्मी लिपीतील अभिलेखात म्हटले आहे. अभिलेखात ही दोन विशेषणे संतती आणि सौभाग्य यांच्याशी संबंधित आहेत. यावरूनच महाकूट आणि सिध्दनकोट्टे या ठिकाणी लज्जागौरी हे अभिधान प्राप्त झालेली ही देवी सर्वत्र संतती देणारी आणि राखणारी देवता म्हणूनच पुजली जात होती, हे स्पष्ट होते.
रुक्मिणीने श्रीकृष्णासोबत विवाह करण्याचा निश्चय केला होता, मात्र तिच्या भावाने शिशुपालासोबत रुक्मिणीचा विवाह निश्चित केला होता.
अमरावती : शहराच्या मध्यभागी असलेले श्री अंबादेवीचे मंदिर प्राचीन असून स्वयंभू मानले जाते. ही मूर्ती वालुकामय पाषाणाची असून पद्मासनात आहे. एक हजार ते १५०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी, असे संदर्भ आढळतात. रुक्मिणी हरणाशीही मंदिराचा संबंध जोडण्यात येतो. त्यावरून याचे प्राचीनत्व लक्षात येते. अमरावतीपासून ३० किमी अंतरावरील कौंडण्यपूर ही त्या वेळी विदर्भाची राजधानी होती. भीष्मक राजा यांचे येथे राज्य होते. भीष्मकाने त्यांची मुलगी रुक्मिणीचे स्वयंवर ठरवले होते. रुक्मिणीने श्रीकृष्णासोबत विवाह करण्याचा निश्चय केला होता, मात्र तिच्या भावाने शिशुपालासोबत रुक्मिणीचा विवाह निश्चित केला होता. त्यामुळे रुक्मिणीने श्रीकृष्णाला गुप्तपणे संदेश पाठवून हरण करण्यास सांगितले होते. रुक्मिणी सख्यांसह अंबादेवीच्या दर्शनासाठी आली असताना भगवान श्रीकृष्णाने तिचे हरण केले अशी आख्यायिका आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. इ.स. १८७० चे ‘गॅझेटियर फॉर दी हैद्राबाद असाईन्ड डिस्ट्रिक्ट’ तसेच इ.स. १९११ व १९६८ च्या अमरावती जिल्हा गॅझिटियरमध्ये याच्या पुरातनत्वाचा उल्लेख आहे. ‘सेटलमेंट रेकॉर्ड’मध्येही हे मंदिर एक हजार ते १५०० वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा पुरावा आढळतो. इ.स. १८६३-१८६४ सालापर्यंत श्री अंबादेवीची मूर्ती केवळ एका चबुतऱ्यावर होती. मंदिर नव्हते. मात्र कालांतराने तेथे छोटे हेमाडपंती मंदिर बांधण्यात आले. त्या काळी वस्ती अमरावतीच्या परकोटाच्या आतच होती. त्यामुळे हे मंदिर जुन्या अमरावतीच्या वेशीवर जंगलात होते. मंदिराच्या शिखराचे बांधकाम इ.स. १८९६ मध्ये करण्यात आले.
हेही वाचा : रेल्वेत मिळणार नवरात्री थाळीची मेजवानी; वाचा कुठे आणि कसे ते?
श्री अंबादेवीची मूर्ती आसनावर विराजमान असून पद्मासनात आहे. तिचे दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवलेले आहेत. दोन्ही नेत्र अर्धोन्मिलित असून शांत आणि गंभीर अशी ध्यानस्थ मुद्रा धारण केलेली आहे. नानाविध षोड्शोपचार पूजा झाल्यावर सुवर्णादि अलंकार, सोन्याचा मुलामा चढविलेला मुखवटा आणि सर्व प्रकारचे अलंकार चढवून विविध पुष्पांची आरास करून देवीला सजविल्यानंतर तिचे देखणे व प्रसन्न रूप भक्तांना आनंदित करते. सोन्याचा मुलामा चढविलेला चांदीचा मुखवटा ९० तोळ्यांचा असून तो १९०५ मध्ये बनविला आहे. महापूजेनंतर आरती व दुपारी १२ वाजता महानवेद्य होतो. पुरणपोळी व खीर यांचा नवेद्य रोज असतो तसेच तांबूलाचा महानवेद्यही होतो. भक्तांना प्रसाद वाटण्यात येतो.
श्री अंबादेवीच्या गर्भगृहाला लागूनच डाव्या बाजूला भैरवनाथाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला भिंतीवरच्या कोनाड्यात संगमरवरी श्री गणेशाची मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे आणखी एक गर्भगृह असून त्यात श्री महादेवाची मोठी पिंड आहे. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवसांना भक्तांची गर्दी असते. मंगळवारी लहानशी यात्राच भरते. नवरात्र महोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा होतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि सप्तशतीच्या पाठाने अष्टमीला यज्ञ होतो, हवन करतात. हा उत्सव नऊ दिवस चालतो. या काळात श्री एकवीरा देवी प्रतिनिधिक स्वरूपात या मंदिरात उपस्थित असते असे मानतात. त्यामुळे हवनासाठी दोन स्थंडिले तयार करतात. दोन स्थंडिलांपैकी एके ठिकाणी श्री अंबादेवी संस्थानाचे मानकरी व दुसरे ठिकाणी एकवीरा देवीचे मानकरी हवन करतात. दशमीला म्हणजे विजयादशमीचे दिवशी श्री अंबादेवीची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा आसनाजवळ जाते.
ही पालखी संपूर्ण चांदीची असून आठही बाजूला चांदीचे खांब आहेत. वर सुवर्णाचा कळस असतो. पालखीसोबत दोन्ही मंदिराचे मानकरी व विश्वस्त असतात. समोर वाद्यवृंद असतो. फार मोठ्या संख्येने लोक असतात. ही पालखी दुपारी चार वाजता सीमोल्लंघनाला निघते. मंगलवाद्ये आणि चौघडा आणि तुतारीही असते. रस्त्यात अनेक भक्त पालखीचे स्वागत सुवासिनींच्या हस्ते ओवाळून करतात. सीमोल्लंघनाच्या रात्री आरती होऊन पालखी परत निघते. मंदिरात आल्यावर दोन्ही देवींची पूजा व आरती होते. अश्विन वद्य दोन ते कार्तिक वद्य दोन या काळात मंदिरात काकड आरती होते. दरवर्षी चत्र महिन्यात शतचंडीचे पाठ रामनवमी महोत्सवात करतात. अष्टमीला हवन होऊन पूर्णाहुती देण्यात येते.
हजारावर नंदादीपमुळे उजळले गुगुळादेवीचे मंदिर, देऊळगाव राजाचे अध्यात्मिक वैभव
बुलढाणा : हजारावर नंदादीपमुळे उजळले गुगुळादेवीचे मंदिर, देऊळगाव राजाचे अध्यात्मिक वैभव
ऐतिहासिक देऊळगाव राजा नजीकच्या गुगुळा देवीचे पुरातन मंदिर नवरात्र निमित्त नंदादीपांच्या झगमगाटाने उजळून निघाले आहे. गिरोली खुर्द जवळ गुगुळा देवीचे पुरातन मंदिर आहे.
ST

बुलढाणा : ऐतिहासिक देऊळगाव राजा नजीकच्या गुगुळा देवीचे पुरातन मंदिर नवरात्र निमित्त नंदादीपांच्या झगमगाटाने उजळून निघाले आहे. गिरोली खुर्द जवळ गुगुळा देवीचे पुरातन मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले मंदिर कमीअधिक ३०० वर्ष जुने असल्याच्या खुणा दिसतात. बाजूलाच फुलविलेल्या सरस्वती उद्यानमधील सुगंधी फुलांचे ताटवे, धबधबा, लहान मुलांसाठी असलेली खेळणी यामुळे भक्तांसह लहान बालकांचेही हे आवडते ठिकाण आहे.
आजूबाजूला असलेल्या जंगलात गुगुळाची झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने हे मंदिर गुगुळा देवीच्याच नावाने प्रसिद्ध आहे. मंदिरात मागील १० वर्षांपासून एक वेगळा उपक्रम राबवला जात आहे. नवरात्रीत अष्टोप्रहर येथे नंदादीप तेवत ठेवण्यात येतात. पहिल्या वर्षी १०१ नंदादीप लावण्यात आले. यंदा त्याने ११०० चा आकडा गाठलाय! नंदादीप लावण्यासाठी घटस्थापनेपूर्वी भाविकांकडून आगाऊ आरक्षण करण्यात येते. गुगुळा देवीवर असलेल्या निस्सीम भक्तीमुळे काही दिवसांतच नंदादीप लावण्यासाठीचे ‘बुकिंग’ पूर्ण होते. जागेअभावी अनेक भक्तांची निराशा होते.
गाव भैरी… धाव भैरी… काय आहे मुरुड जंजिऱ्याच्या कोटेश्वरीचा महिमा !
किंबहुना आख्यायिकेनुसार त्यांची शिंगे एकमेकांवर आदळण्याचा आवाज येत असे. नंतर हा रेडा मंदिराजवळ आणून त्याचा बळी देऊन प्रसाद तीन समाजात वाटला जाई.
नारळी पोफळीच्या बागांचे पांघरूण घेऊन निळ्याशार सागराची गाज लाभलेल्या कोकणातील टुमदार गाव म्हणजे ‘मुरूड जंजिरा’. सुंदर निसर्ग, अभेद्य जंजिरा, ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ला, जागृत देवस्थाने लाभलेल्या या गावाच्या रक्षणास सदैव सज्ज असते ती म्हणजे या गावची ग्रामदेवता ‘कोटेश्वरी माता’. मुरूड या गावात अनेक प्रसिद्ध आणि जागृत देवदेवतांची मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटेश्वरी मातेचे मंदिर आपल्याला गावाच्या वेशीवर पाहायला मिळते. कोटेश्वरी देवी ही मुरुडमधील अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे.
कोटेश्वरी देवीच्या मंदिराची रचना
सध्या कोटेश्वरी देवीचे जे मंदिर आपण पाहतो, ते नवीन बांधकाम आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर ही नवीन रचना मंदिराला मिळाली. या मंदिराची जुनी रचना लाकडी बांधकाम असलेली तसेच कौलारू रचना होती, पूर्वी देवीचे पुजन ‘तांदळा’च्या स्वरूपात होत असे. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही कोटेश्वरी आणि कोळेश्वरी देवीचा तांदळा आणि अलिकडच्या काळात स्थापन केलेली देवीची संगमरवरी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मंदिराबाहेर दीपस्तंभ, तुळशी वृंदावन आणि वधस्तंभाचा काही भाग आपल्याला पाहायला मिळतो. मंदिरात प्रवेश केल्यावर एका कोपऱ्यात आणखी एका देवीचे स्थान आहे. त्या देवीचे नाव अज्ञात असून स्थायिक परंपरेनुसार कांजण्या, गोवर या रोगांपासून रक्षण करणारी ही देवी आहे. तसेच या देवीचे नाव घेतलं जात नाही, असे स्थानिक सांगतात.
कोटेश्वरी देवीचे आगमन
कोटेश्वरी देवीचा उगम कोणत्या काळात आणि कसा झाला हे निश्चित सांगता येत नाही. परंतु या देवीचे मूळस्थान ‘कासा’ म्हणजेच ‘पद्मदुर्ग किल्ला’ आहे. या किल्ल्यातून देवी लाकडी खांबावर बसून समुद्रमार्गे मुरूडमध्ये आली, असे ग्रामस्थ सांगतात. ज्या किनारी भागाजवळ खांब वाहत आला तिथे देवीची स्थापना करण्यात आली, आजही एक लाकडी खांब आपल्याला मंदिराबाहेर पाहायला मिळतो. तर श्रीछत्रपतींच्या पद्मदुर्ग किल्ल्यात जे देवीचे स्थान आहे तिथेसुद्धा एका खांबाचा बुंधा आपल्याला पाहायला मिळतो. काही ग्रामस्थ देवी गावच्या वेशीवर तांदळ्याच्या स्वरूपात प्रकट झाली, असे सांगतात. मंदिरात आपल्याला मुखवटा लावलेला कोटेश्वरी तसेच कोळेश्वरी देवीचा तांदळा पाहायला मिळतो. ही देवी नवसाला पावणारी आणि रोगराई नष्ट करणारी अशी मान्यता आहे.
देवीचा उत्सव
नवरात्र उत्सव तसेच चैत्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने कोटेश्वरी देवीच्या मंदिरात साजरा केला जातो. भजन कीर्तन करून देवीची प्रार्थना केली जाते. श्रावणात देवीचा सप्ताह भरविला जातो. नवरात्री उत्सवादरम्यान गावातील विवाहित स्त्रिया कुमारिका पूजन करून त्या कुमारिकांना लाह्या आणि फळांची खिरापत देऊन मग देवीची ओटी भरण्यासाठी आणि देवीला खिरापत अर्पण करण्यासाठी मंदिरात येतात. देवीला डाळ, भात, भेंडी -पोकळा भाजी, खीर वडे असा नैवेद्य दाखविला जातो. मुरूडमध्ये कोटेश्वरी मातेचा चैत्रीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या चैत्रीच्या उत्सवाला मोठी जत्रा भरविली जाते. या जत्रेला मुरूडमधीलच नव्हे तर मुरूडच्या आसपासच्या गावातील ग्रामस्थदेखील उपस्थिती लावतात. या चैत्रीच्या उत्सवाचा उल्लेख आपल्याला कुलाबा गॅझेटियरमध्ये सुद्धा सापडतो.
कोटेश्वरी देवीच्या आगळ्या वेगळ्या प्रथा
पूर्वी कोटेश्वरी देवीला चैत्रीच्या उत्सवाला रेडा बळी देण्याची प्रथा होती. ही जबाबदारी गुरव समाजाकडे असे. मुरूडच्या आसपासच्या प्रदेशातून हा रेडा आणला जाई. उत्सवाच्या दिवशी रेड्याचे पाय रांगोळी स्वरूपात जमिनीवर काढून पुजले जात. तसेच उत्सवाच्या एक दिवस आधी हा रेडा संपूर्ण मुरूडमध्ये फिरवला जाई आणि ग्रामस्थ गाव भैरी… धाव भैरी… अशा घोषणा देत. नंतर हा रेडा मुरूडमध्ये दिंडीचा तळा या ठिकाणी सोडला जाई. ग्रामस्थांच्या श्रद्धेनुसार या रेड्याची देवीच्या अदृश्य खुलग्यासोबत झुंज होत असे, किंबहुना आख्यायिकेनुसार त्यांची शिंगे एकमेकांवर आदळण्याचा आवाज येत असे. नंतर हा रेडा मंदिराजवळ आणून त्याचा बळी देऊन प्रसाद तीन समाजात वाटला जाई. १९३५ सालच्या आसपास जंजिरा संस्थानाचे दिवाण कोटक, तसेच ग्रामस्थ श्री.रामचंद्र कार्लेकर, श्री.रामजी दिवेकर यांच्या पुढाकाराने ही प्रथा बंद झाली. पुढे रेडा बळी बंद झाल्यावर चैत्रीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी कोटेश्वरी देवीला पद्मदुर्ग किल्ल्यात जाऊन उत्सवासाठी आमंत्रित करून देवीचा मुखवटा असलेली पालखी संपूर्ण मुरूडभर फिरविण्याची प्रथा रूढ झाली. तसेच मुरूडमधील विविध ठिकाणांहून महादेवाच्या काठ्या मोठ्या दिमाखात सजवून नाचत-गाजत आणून मंदिरासमोरील पटांगणात हातावर नाचविल्या जात आणि आजही ही प्रथा अखंड सुरू आहे.
कोटेश्वरी देवीची हातकोडा प्रथा
या प्रथेप्रमाणेच पूर्वी हातकोडा ही देखील एक प्रथा रूढ होती. जी व्यक्ती देवीला नवस करीत असे, त्या व्यक्तीच्या हातात हातकोडे घालून हातात नारळ पकडण्यासाठी दिला जात असे आणि त्या नंतर देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यास सांगितले जाई. प्रदक्षिणा घालीत असताना हातातील नारळ जिथे पडेल तिथे तो फोडला जाई आणि देवीला अर्पण केला जाई.
कोटेश्वरी देवीच्या मंदिराला नवाबाकडून देणगी
या मंदिरातील पुजारी गुरव समाजाचे असून मंदिराची देखभाल कोटेश्वरी देवस्थान ट्रस्ट करीत आहे. या मंदिराला भाविक विविध स्वरूपात देणगी देतात. पुर्वी मुरूड संस्थानाचे नवाबसुद्धा इतर मुरूडमधील ठिकाणांप्रमाणे या मंदिराला देखील दरमहा २ रुपये देणगी देत होते. पुढे संस्थानाच्या विलणीकरणानंतर देखील ही देणगी देण्याची प्रथा कायम असून, दर महिन्याला मंदिराच्या ट्रस्टकडे तहसील कार्यालयातून सुपूर्त केली जाते.
अशी ही भक्तांच्या नवसाला पावणारी आणि रोगराई पासून बचाव करून मनोकामना पूर्ण करणारी मुरूडची ग्रामदेवता आजही मुरूडच्या वेशीवर मुरूडचे रक्षण करत आहे.
(लेखिका: प्रितम वाळंज, प्राध्यापिका, नज ॲकेडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स, मुरुड)
चंद्रपूर – राणी हिराईच्या प्रतिज्ञेचे प्रतीक माता महाकाली मंदिर
>> अभिषेक भटपल्लीवार
राणी हिरातानीच्या आग्रहास्तव प्राचीन चंद्रपूरची देवता महाकाली देवीचे मंदिर प्रथम गोंड वंशाचा 10वा राजा खंडक्या बल्लारशाह (इ.स. 1472 ते 1491) याने बांधले होते. गोंडराजे खांडक्याने प्रथम चंद्रपूर शहराची स्थापना केली होती. झरपट नदीच्या काठी एका खंदकात महाकाली मातेची दगडी मूर्ती दिसली. राजा खंडक्या बल्लारशहाने त्याच ठिकाणी एक छोटेसे मंदिर बांधले. परंतु आज अस्तित्त्वात असलेले माता महाकालीचे विशाल मंदिर चंद्रपूरच्या अहिल्याबाई म्हणून ओळखल्या जाणार्या राजा वीरशाहाच्या राणी हिराईने बांधलेले आहे.
आपल्या मुलीचा अपमान केल्याबद्दल राणी हिराईने आपल्याच जावयाचा शिरच्छेद करण्याची प्रतिज्ञा घेतली. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील देवगंड राजवंश दुर्गशाहा (जावई) चा शिरच्छेद करून माता महाकालीच्या चरणी अर्पण करण्याचे व्रत घेतले होते. राजा वीरशाहाने जावई दुर्गशाहाचा युद्धात पराभव केल्यावर दुर्गशाहाचा शिरच्छेद करून माता महाकालीच्या चरणी मोठ्या थाटामाटात अर्पण करण्यात आला. राणी हिराईची प्रतिज्ञा पूर्ण झाली. राणी हिराईने खांडक्या बल्लारशाहने बांधलेले जुने मंदिर पाडून त्याला एका विशाल मंदिराचे स्वरूप दिले. राजा वीरशहाच्या दुर्गशाहावरील विजयाची स्मृती कायमस्वरूपी जिवंत राहावी म्हणून राणी हिराईने दुर्गशाहाचे दगडी शीर बनवून मंदिराच्या कळसाखाली बसवले.
राणी हिराईच्या कार्यकाळात मंदिराच्या पुनर्बांधणीत आकर्षक वास्तुकलेचे उदाहरण पाहायला मिळते. आतील आणि बाहेरील भिंतींवर उत्कृष्ट कलाकृती करून त्याची विशालता वाढविण्यात आली आणि आतील कमानींवर रंगीबिरंगी चित्रे काढण्यात आली जी स्वतःच अद्वितीय मानली जाते. गोंड काळातील रंगीत चित्रे फक्त महाकाली मंदिरातच पाहायला मिळतात. महाकाली मंदिरानंतर राणीने अनेक मंदिरे बांधली आणि चंद्रपूरच्या इतिहासात अजरामर झाली. तेव्हापासून दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून मंदिरात महिनाभर यात्रा भरते आणि नांदेड, मराठवाड्यातील भाविक तेथे येऊन पूजा करतात. त्यानंतर चंद्रपुरात यात्राचा जल्लोष सुरू होतो. अशी माहिती गोंडवाना इतिहास संशोधक अशोक सिंह ठाकुर यांनी दिली.
महाकाले परिवाराची 11 वी पिढी करीत आहे पूजा
14 व्या शतकातील माता महाकाली मंदिर राणी हिराईच्या प्रतिज्ञेचे साक्ष आहे.भव्य मंदिर उभारल्या नंतर त्याचे पौरोहित्य महाकाले परिवाराकडे देण्यात आले.आज 500 वर्षाचा कार्यकाळ लोटल्या नंतरही महाकाले परिवाराची 11 वी पिढी सेवेत आहे.यात नामदेवराव महाकाले यांचे चिरंजीव विजय,प्रकाश,सुनील,अनिल,दिनेश व मोहन या 6 मुलांचा समावेश आहे.विजय व दिनेश आता हयात नाही.अशी माहिती अनिल महाकाले यांनी दिली.
…आणि कळसा खाली उत्तरेला स्थापित झाले शीर
राणी हिराईची प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर दुर्गशाहाचे शीर माता महाकालीला अर्पण करण्यात आले.परंतू मुलीच्या अपमानाची घटना व त्याचा परिणाम प्रजेला माहीत असावा म्हणून राणी हिराईने दुर्गशाहाचे दगडाचे प्रतिकात्मक शीर(मुंडके)तयार करून मंदिराच्या कळसाखाली उत्तरेला(रस्त्याच्या बाजूने)स्थापित केले.जे आजही बघायला मिळते.गोंडराज्यात मातृशक्तीला अनन्यसाधारण महत्व होते.
http://www.saamana.com/chandrapur-rani-hirai-mata-mahakali-temple/
गडदेवतांना नमन
शिवकाळात कोणताही नवीन गड बांधण्याच्या वेळी सुरुवातीलाच त्या गडावर गडदेवतेची स्थापना केली जायची. गडाच्या नावावरून त्या गडदेवतेचे नाव ठरायचे. शिवनेरीची शिवाई, वर्धनगडाची वर्धनीमाता, कोरीगडाची कोराई, जीवधनची जिवाई, अंकाई गडावरची अंकाई, कर्णाळा किल्ल्यावरची कर्णाई, निमगिरीची निंबादेवी अशी अनेक नावे आहेत.
गडकोटांवरील देवीच्या वास्तव्यामुळे मावळय़ांना मानसिक बळ मिळायचे, अशी धारणा होती. त्यांच्या मनातील भीती दूर व्हायची. मंगलकार्यासाठी देवीचे शुभाशीर्वाद मिळायचे. या देवींचा कौल घेऊनच गडावर मोठमोठी कामे केली जायची.
शिवकाळात या मंदिरात नित्यनेमाने पूजाअर्चा केली जायची. नवरात्रीत तर गडावर मोठी धामधूम असायची. झांज, हलगी आणि ताशाच्या निनादात देवीचा जागर केला जायचा. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे या गजरात जागरण, गोंधळात गड न्हाऊन निघायचा. या काळात मंदिरांची नव्याने डागडुजी केली जायची. मंदिराची सजावट केली जायची. देवीला गोडधोड नैवेद्य दाखवला जायचा. संपूर्ण गड नऊ दिवस देवीच्या सेवेत रममाण व्हायचा.
उत्तरोत्तर मात्र जसे किल्ल्यांचे महत्त्व संपुष्टात आले तसा लोकांचा किल्ल्यांवरचा राबताही कमी झाला. त्यामुळे एकेकाळी अखंड घंटानाद अनुभवणारी, सहस्र दिव्यांनी उजळत असलेली ही देवीची मंदिरे पुढे पूर्णपणे ओस पडून दुर्लक्षित झाली. याला अपवाद फक्त प्रतापगड, पारगड, रत्नदुर्ग, सुधागडावरील देवीची मंदिरे. ही बोटावर मोजण्याइतकी मंदिरे सोडली तर आज बाकी गडकोटांवरील देवीची मंदिरे दुर्दैवाने दुर्लक्षित आहेत. शेकडो वर्षे उलटूनसुद्धा आजही वाघजाई, जाखमाता, मेंगाई, विंझाई, जननी, पद्मावती, गोळावती अशा अनेक नावांनी या देवी गडकोटांवर विराजमान आहेत.
नवरात्रीच्या काळात देवीचे मंदिर म्हटले की, गर्दी आलीच, पण सह्याद्रीतील गडकोटांवर तशी परिस्थिती नाही. कुठल्याही रांगेत उभे न राहता आडरानात एकांतात असलेल्या या देवींचे आपण सहज दर्शन घेऊ शकतो. फक्त यासाठी गडकिल्ले भटकंतीचे वेड मनात पाहिजे.
गड दुर्गम भागात, दाट जंगलात असल्याने वाघासारख्या हिंस्र जंगली श्वापदांची येथे कायमच दहशत असायची. ती घालवण्यासाठीसुद्धा वाघ जिचे वाहन आहे त्या वाघजाई देवीची गडावर प्रतिष्ठापना केली जायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर आणि कोल्हापूर जिह्यातील पारगडावर भवानी देवीचे मंदिर बांधले. वर्धनगडावरील देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार महाराणी ताराबाईंनी केल्याची नोंद आहे.
मोहटादेवीला तांबूल प्रसाद प्रिय !

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : मोहटादेवीला भाविकांकडून विविध प्रकारचे नैवेद्य व प्रसाद अर्पण केला जातो. यामध्ये प्रामुख्याने आगळा वेगळा आणि देवीला अतिशय प्रिय असणारा तांबूल प्रसाद तयार करण्यासाठी देवस्थान समिती व महिला भाविकांची लगबग सुरू आहे. तांबूल प्रसाद करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आजही देवस्थान समितीकडून सुरू आहे. माहूरच्या रेणुका मातेला मोठ्या प्रमाणात तांबूलचा प्रसाद अर्पण करून तो भाविकांना वाटला जातो. मोहटादेवी हे माहूरच्या रेणुकामातेचे अंशात्मक स्वयंभू स्थान आहे. त्यामुळे मोहटादेवीलाही तांबूलच्या प्रसादाचे महत्त्व प्राप्त आहे. तांबूल प्रसाद तयार करण्यासाठी प्रामुख्याने नागिणीचे पान व इतर 14 प्रकारचे पदार्थ टाकले जातात. त्यामध्ये कात, चुना, सुपारी, ज्येष्ठमध, बडीशेप, धना डाळ, गुलकंद, आसमानतारा, लवंग, विलायची, गुंजपाला, खोबर्याचा किस, जायफळ या पदार्थांबरोबर नागिणीचे पान खलबत्त्यामध्ये कुटून त्याचा बारीक भुगा केला जातो. तो होणारा भुगा म्हणजे देवीचा अतिशय प्रिय असणारा तांबूल प्रसाद होय.
अनेक भाविक तांबूलचा प्रसाद तयार करण्यासाठी नागिणीचे पान व इतर पदार्थ देवीचरणी अर्पण करतात. या सर्व पदार्थांचे एकत्रित मिश्रण करण्याचे काम देवस्थान समितीकडून होते. घटी बसणार्या महिला भाविक व ब्राह्मण पुजारी यांच्या कुटुंबातील महिला देवीची गाणी म्हणत देवीचा तांबूल प्रसाद मोठ्या भक्तीभावाने तयार करतात. नवरात्र उत्सवात पहिल्या माळेपासून ते पौर्णिमेपर्यंत या पंधरा दिवसाच्या कालावधीत तांबूल प्रसाद रोज मोहटादेवीला ठेवला जातो. दरम्यान, सहाव्या व सातव्या माळ्याच्या निमित्ताने मोहटादेवी गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह विविध भागातून भाविक पायी चालत मोहटादेवी गडावर गर्दी करत आहे. अहमदनगर येथील देवीभक्त वाहतूक व्यावसायिक राजू बलभीम सानप यांनी मोहटादेवीच्या मंदिर गाभार्यात आकर्षक अशी सुंदर फुलांची सजावट केली आहे.
भाविकांचे श्रध्दास्थान रेणापुरचे श्री रेणुकादेवी मंदिर
रेणापूर , विठ्ठल कटके रेणापूरला ८०० वर्षापूर्वीचे ऐतिहासिक वारसा लाभलेले ग्रामदैवत श्री रेणुकादेवीचे हेमाडपंती, दगडी बांधकाम केलेले भव्य दिव्य मंदिर आहे. भाविक भक्तांच्या हाकेला धावून येणारी, त्यांची मनोकामना पूर्ण करणारी श्री रेणुका माता लाखो भाविक भक्तांचे एक मोठे श्रध्दास्थान आहे. ग्रामदैवत अदिशक्ती श्री रेणुका देवीच्या मंदीराची स्थापना कधी झाली हे निश्चीत सांगता येत नाही. मात्र या श्री रेणुकादेवी मंदीराचा उल्लेख संत नामदेव गाथेमध्ये पुढीलप्रमाणे आढळतो.
” रेणापूरी रेणुका, जमदग्नीसी भेटली देखा! तियेचे पोटी विश्वतारका परशुराम जन्मले !! ”
जेंव्हा नव्हते चराचर ! तेंव्हा होते पंढरपुर,
त्याही अगोदर रेणापूर ! ”
हे मंदीर ८०० वर्षांपेक्षाही पूर्वीचे असावे. असे सांगण्यात येते. पुर्वी भिंगरी या नावाने रेणापूरची ओळख होती, श्री रेणुका मातेच्या आगमनानंतर तिच्या नावानेच रेणापूर हे नाव पडले असावे. ८०० वर्षापूर्वी गावच्या पाटलांकडून श्री रेणुकादेवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. श्री रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी दंडकारण्याचा प्रदेश असलेल्या रेणापूर या गावात वास्तव्यास असल्याचे वर्णन मार्कडेंय पुराणात आढळते. ४०० वर्षापासून या मुर्तीची पुजाअर्चा करण्याचे काम येथील पुजारी बापू धर्माधिकारी यांचे वंशज करीत आहेत.
श्री रेणुकादेवी मंदीराचे बांधकाम १७ व्या शतकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले. त्यांनी मूर्तीचा गाभारा व सभामंडपाचे हेमंडपंती दगडी बांधकाम केले आहे. १९५० च्या कालावधीत मंदीराच्या समोर दगडी सभामंडपाचे बांधकाम याच गावातील हलकुडे परिवारांकडुन करण्यात आले आहे. १९६० च्या नतर गोविंददेव धर्मधिकारी यांनी श्री रेणुका देवीची पुजाअर्चा करण्याचे काम गुरवांच्या स्वधीन केले. आजही धर्मधिकारी व गुरव कुटूंब श्री रेणुकादेवीची सर्व पुजाअर्चा करीत आहेत. गेल्या चारशे वर्षांपासुन दत्ता गोंधळी परिवाराकडुन दररोज देवीच्या आरतीच्यावेळी संभळ वाजविला जातो. तसेच घडसे परिवार दररोज दुपारी बारा वाजता नित्यनेमाने चौघडा वाजवतात.
हलती दीपमाळ
५० फुट उंचीची दगड विटानी बांधलेली षटकोणी आकाराची “हलती दिपमाळ” ही या
मंदीराचे वैशिष्ट्य आहे. वरच्या टोकावर तीन सिंहांची प्रतिकृती असुन,
दिपमाळेला हलविण्यासाठी दिपमाळेवर चढावे लागते. दिपमाळ हलविणारा व्यक्ती
वरच्या असलेल्या लोखंडी दोन्ही कड्यांना घट्ट पकडून या दिपमाळेला सहज
हलवितो. दिपमाळ कशी हलते, कशामुळे हलते, याबाबत कसलीच माहिती उपलब्ध नाही.
दुर्गा पूजा इंग्रजांच्या काळात लोकप्रिय का झाली?
शरद ऋतूच्या आगमनासमवेत वाऱ्याच्या थंड झुळुकांनी अंग शहारून जाते, याच मन मोहून टाकणाऱ्या वातावरणात बंगाल तसेच पूर्व भारतात देवीच्या आगमनाची चाहूल लागते. हीच ती दुर्गा देवीच्या माहेरी येण्याची वेळ, प्रत्येक घराघरात, रस्त्यावर, गल्लोगल्ली उत्साहाचे वातावरण असते. बंगाल प्रांतातील दुर्गापूजा विशेषच प्रसिद्ध आहे. प्रत्येक बंगाली व्यक्तीसाठी हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणारा हा सण आहे. या वर्षीही ‘माँ दुर्गे’चे मोठ्या उत्साहात आगमन आणि स्वागत बंगाली भाषकांकडून झाले. याच पार्श्वभूमीवर बंगालमधील दुर्गापूजेचा इतिहास आणि वसाहतवादी राजवटीत साजरा झालेली दुर्गापूजा यांच्याविषयी जाणून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहे.
पहिली दूर्गापूजा ब्रिटिश अधिकाऱ्यासमवेत?
बंगाल मधील दुर्गा पूजेच्या उत्पत्तीच्या अनेक कथा उपलब्ध आहेत. १७५७ साली प्लासीच्या लढाईनंतर दुर्गा पूजा अधिक लोकप्रिय झाल्याचे इतिहासकार मानतात. रॉबर्ट क्लाइव्ह या ब्रिटिश अधिकाऱ्याने नवाब सिराज उदौला याचा या लढाईत पराभव करून भारताच्या इतिहासाचा मार्ग बदलला. या युद्धातील विजयानंतर बंगालवरील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची पकड अधिक मजबूत झाली. या विजयाने क्लाइव्हलाही खूप श्रीमंत केले. अत्यंत धार्मिक असलेल्या क्लाइव्हने आपल्या अविश्वसनीय भाग्याचे श्रेय देवाला दिले. त्याला या यशासाठी आभार व्यक्त करण्याकरता कलकत्ता येथे एक भव्य समारंभ आयोजित करायचा होता. पूर्वीच्या नवाबाने शहरातील एकमेव चर्च उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे क्लाइव्हचे पर्शियन भाषांतरकार आणि जवळचे विश्वासू ‘नबकिशन देब’ हे पुढे आले. डेब यांनी क्लाइव्हला त्यांच्या हवेलीत येण्यास सांगितले आणि दुर्गादेवीला नैवेद्य दाखवला अशा प्रकारे कलकत्त्यातील पहिली दुर्गापूजा सुरू झाली, असे मानले जाते.
आणखी वाचा: Sharadiya Navaratra 2023: महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीतील जगदंबेचा निस्सीम भक्त ‘भुत्या’, आहे तरी कोण?
पुरावा नाही
सोवाबाजारमधील देब यांचा वाडा, आजही पश्चिम बंगालच्या पर्यटन विभागाने जतन केला आहे, त्या वाड्याला आजही “कंपनी पूजा” म्हणून ओळखले जाते. ही कथा प्रसिद्ध असली तरी ती तितकीशी पटणारी नाही. १७५७ सालापूर्वी, देब हे क्लाइव्हला ओळखत असल्याची कोणतीही नोंद नाही. एक निनावी पेंटिंग वगळता, त्या वर्षी दुर्गा पूजा प्रत्यक्षात झाल्याचा कोणताही पुरावादेखील नाही. सोवाबाजार पूजा ही कलकत्त्यामधील सर्वात जुनी असली तरी तिच्या उत्पत्तीची ही कथा अत्यंत संशयास्पद आहे.
कथेतून इतिहासाचा शोध
असे असले तरी, ही कथा कलकत्ता येथील दुर्गापूजेच्या समाजशास्त्रीय उत्पत्तीचे रूपक म्हणून काम करते. सोप्या भाषेत सांगायचे तर, आधुनिक दुर्गापूजेच्या उत्पत्तीसाठी बंगाली जमीनदार आणि व्यापारी तसेच ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील संबंधांना श्रेय दिले जाऊ शकते. बंगालमध्ये कंपनीच्या राजवटीत अनेक सामाजिक आणि आर्थिक बदल झाले. दुर्गापूजेच्या कथेच्या इतिहासातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, कंपनीच्या राजवटीचे फायदे मिळवून देणार्या शक्तिशाली स्थानिकांच्या नवीन वर्गाचा उदय हा होता. प्रथम जमीनदार किंवा वंशपरंपरागत जमीनदार होते. केंद्रिकृत मुघल राज्याच्या ऱ्हासानंतर, बंगालमधील जमीनदार अधिकाधिक प्रभावशाली झाले आणि त्यांनी स्वतःची जहागिरी ठामपणे राबविण्यास सुरुवात केली. १७९३ सालच्या कायमस्वरूपी सेटलमेंट कायद्याने त्यांची स्थिती भक्कम करून, कंपनीने त्यांना कंपनी आणि स्थानिक लोकांमध्ये मध्यस्थ म्हणून प्रभावीपणे राबवले.
आणखी वाचा: Shardiya Navratri 2023: भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील?
भक्तीपेक्षा भोग प्रभावी
जमीनदारांनंतर श्रीमंत बंगाली व्यापाऱ्यांचा उदयोन्मुख वर्ग होता, विशेषत: कलकत्त्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरी केंद्रात त्यांचे प्रस्थ होते. कंपनीच्या राजवटीत पूर्वी कधीही न पाहिलेल्या आर्थिक संधी त्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या होत्या. काही लोक खूप लवकर श्रीमंत झाले. अशा प्रकारे टागोर किंवा मल्लिक यांसारखी मोठी व्यापारी कुटुंबे उदयास आली. इतिहासकार तपन रायचौधरी यांनी ‘मदर ऑफ ब्रह्मांड, मदर लॅण्ड’ नावाच्या आपल्या शोधनिबंधात नमूद केल्याप्रमाणे, नुकत्याच श्रीमंत झालेल्या भारतीय व्यापाऱ्यांसाठी दुर्गापूजा स्वतःच्या संपत्तीचे प्रदर्शन आणि आपल्या गोऱ्या साहेबाप्रति प्रेम दर्शविण्याचा सोहळा झाला. रायचौधरी यांच्या मते, “भक्ती पेक्षा भोग” हा या सणांचा मुख्य हेतू झाला होता. प्रतिस्पर्धी कुटुंबे शक्य तितक्या भव्य पूजेचे आयोजन करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत, मूर्ती सोन्याने सजवल्या जात, लखनऊ आणि दिल्लीसारख्या दूरच्या नृत्य करणाऱ्या मुलींना (भाड्याने) आणले जाई, अगदी ब्रिटीश गव्हर्नर-जनरल यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाई.
पूजा आणि राष्ट्रवादी चळवळ
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, बंगाली लोकांमध्ये, विशेषत: सुशिक्षित बुद्धीमंतांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. बंकिमचंद्र यांची ‘आनंदमठ’ ही कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात संन्यासी विद्रोहाची काल्पनिक आवृत्ती असलेल्या या कादंबरीने “बंदे मातरम्” हा वाक्प्रचार लोकप्रिय केला – ‘माता’ म्हणून ‘राष्ट्रा’ची कल्पना लोकांमध्ये निर्माण करण्यात आली. त्यानंतर देवी दुर्गा, “मा” (किंवा माता, राष्ट्रमाता) दुर्गा म्हणून पूजली गेली, अशा प्रकारे राष्ट्राचे अंतिम मूर्तरूप दुर्गादेवीच्या स्वरूपात पुढे आले, तसेच परकीय राजवटीपासून तारणहार म्हणून काम करणारी प्रतिकृती तिच्या स्वरूपात अग्रणी ठरली. त्यामुळेच दुर्गापूजा अचानक नवजात राष्ट्रवादी प्रकल्पाचा एक भाग झाली. १९०५ साली मध्ये लॉर्ड कर्झनने घेतलेल्या बंगालच्या फाळणीच्या निर्णयानंतर तर ती अधिक लोकप्रिय झाली. ‘बंदे मातरम्’ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिले जनआंदोलन मानल्या जाणार्या स्वदेशी चळवळीच्या लढाईचे घोषवाक्य झाले, दुर्गा पूजा हा सांप्रदायिक उत्सव आता सामूहिक चेतना आणि प्रेरणेचे ठिकाण ठरला होता.
प्रतिकात्मक लढा पूजेच्या रूपात
इतिहासकार रॅचेल मॅकडरमॉट यांनी त्या काळातील दुर्गा पूजांबद्दल
‘रेव्हलरी, रिव्हलरी आणि लोंगिंग फॉर द देवी ऑफ बंगाल’ (२०११) या
पुस्तकामध्ये नमूद केल्याप्रमाणे. “तत्कालीन बंगाली वृत्तपत्रे पूजांच्या
जाहिरातींनी भरलेली होती. काही बिदेशी [विदेशी], तर काही स्वदेशी देशी
तेले, रेशम, धुत्या, साड्या, शूज, चहा, साखर, सिगारेट इत्यादी वस्तूंच्या
विद्यासागर, श्री दुर्गा, आणि दरबार अशा ब्रॅण्डच्या जाहिरातींनी भरलेली
होती. पूजेच्या वेळी, ब्रिटीश उच्चभ्रूंचे पूर्वीपेक्षा खूपच कमी स्वागत
झाले होते. रायचौधरी यांनी नमूद केल्याप्रमाणे, “एका ब्रिटिश अधिकाऱ्याने
सांगितले की त्याने दुर्गेची प्रतिमा पाहिली होती, जिथे म्हशीच्या
राक्षसाची जागा त्याच्या एका सहकाऱ्याने घेतली होती.”
१९२० च्या दशकात,
सार्वजनिक पूजा उदयास येऊ लागल्या. हा श्रीमंत बंगाली उच्चभ्रूंचा उत्सव
असल्याने, पूजा ही प्रत्येकासाठी एक उत्सव होऊ लागली. मॅकडर्मॉट यांच्या
मते, हा अस्पृश्यतेविरुद्धच्या गांधीवादी वक्तृत्वाचा तसेच हिंदू
एकत्रिकरणाच्या गरजेचा परिणाम होता.
पहिली ‘सार्वत्रिक’ पूजा
पहिली ‘सार्वत्रिक’ पूजा १९२६ साली कलकत्ता येथील माणिकतला येथे आयोजित करण्यात आली होती. मॅकडरमॉट यांनी नमूद केल्याप्रमाणे, ती सर्वसमावेशक होती, जन्म (जात) किंवा निवासस्थानाची पर्वा न करता “सर्वांसाठी खुली” होती. “पहिल्यांदा, पंडाल (मंडप) किंवा बांबू, कापडापासून बनविलेले तात्पुरते मंदिर, सार्वजनिक रस्त्यांवर, गल्ली-बोळात आणि क्यूल-डी-सॅकमध्ये बांधले गेले. त्यानंतर दूर्गापूजेच्या सार्वजनिक उत्सवांची एक वेगळी परंपरा सुरू झाली आणि त्या परंपरेने कळस गाठला!
शस्त्रपूजनाची खंडेनवमी

वरात्र उत्सवातील महानवमी तिथीला खंडेनवमी म्हटले जाते. ‘खंडे’चा मूळ शब्द खांडा. खांडा म्हणजे तलवार अर्थात खड्ग ! खड्ग पूजन या दिवशी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने केले जाते. मध्ययुगापासून आजतागायत शस्त्र धारण करणारे जे जे समाज आहेत, ते ही खंडेनवमी मोठ्या श्रद्धेने साजरी करतात. मराठा, रजपूत समाज आणि स्वतःस क्षत्रिय मानणारे समाज प्रामुख्याने खंडेनवमी साजरी करतात. त्याचबरोबर विविध व्यावसायिक, शिल्पकार, कलाकार, कारागीर आपापल्या व्यावसायिक हत्यारांची पूजा करतात. (Khandenavami 2023)
खंडेनवमी म्हणजे शक्तिमातेचे पूजन सामर्थ्य प्राप्त व्हावे, संकटावर मात व्हावी, सौख्य-समाधान प्राप्त व्हावे, हा या पूजनामधील हेतू! यादिवशी शस्त्रास्त्रांची आकर्षक मांडणी आणि सजावट करून शस्त्रास्त्रांचे विधिवत पूजन करण्यात येते. त्या बरोबरच होमहवन, नवग्रह पूजन, नवार्ण मंत्र हवन, सप्तशती पाठ आदी विधीही आपापल्या शक्ती – कुवतीनुसार केले जातात.
भारतात सर्व राज्यात हा उत्सव साजरा केला जात असला, तरी महाराष्ट्र आणि राजस्थान या लष्करी परंपरा असलेल्या राज्यात मराठा समाज आणि राजपूत समाज मोठ्या भक्तिभावाने शस्त्रास्त्र पूजन करतात. मराठ्यांना तलवार ही अत्यंत प्रिय. त्यामुळे खंडेनवमी आधी आपली सारी हत्यारे घासून पुसून लख्ख करण्याकडे आणि हत्यारांना शिकल करण्याकडे म्हणजे हत्यारे पाजळण्यात मराठा समाज गुंतलेला असतो. राजपूत समाजात नऊ दिवस शस्त्र पूजन चालते. या काळात खड्गाची मिरवणूकही काढली जाते.
इतिहास लेखनाच्या दृष्टीने भारतात हर्षवर्धनच्या काळापासून म्हणजे
सातव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मध्ययुग मानले
जाते. त्यापूर्वीचा काळ प्राचीन काळ मानला जातो. या मध्ययुगात लढायांचे
प्रमाण वाढले आणि त्याबरोबर शस्त्र आणि शस्त्रधारी यांचेही प्रमाण वाढले.
युद्ध करणाऱ्या क्षत्रिय समाजाचे महत्त्व अधोरेखित झाले. पारंपरिक
शस्त्रांबरोबर अद्ययावत शस्त्रास्त्राकडे लक्ष वेधले गेले. भारतात चौदाव्या
शतकात तोफा आणि बंदुका- पिस्तुले आदी शस्त्रास्त्रांचे आगमन झाले.
उत्तरोत्तर शस्त्रास्त्रांचे महत्त्व वाढत गेले आणि त्याबरोबर खंडेनवमीचे
शस्त्रपूजन हा महत्त्वाचा विधी झाला. यथासांग, यथाविधी शस्त्रपूजन
करण्याकडे कल आणि ओढावाढला. पंडित कमलाकर भट्टयांचा निर्णयसिंधू हा
सोळाव्या शतकातील महत्त्वाचा ग्रंथ. या ग्रंथात धर्मशास्त्रीय निर्णयाचे
विवेचन आहे. त्यात वेगवेगळ्या शस्त्रांचे पूजा, विधीचे मंत्र दिले आहेत.
निर्णयसिंधू हा ग्रंथ सर्व हिंदू समाजात मान्यताप्राप्त असल्याने
शस्त्रपूजन यथासांग, यथाविधी आणि शास्त्रोक्त पद्धतीने सुरू झाले.
(Khandenavami 2023)
महाराष्ट्रात चौदाव्या पंधराव्या शतकापासून राजधुरीण लढवय्या मराठा समाजाची घराणी उदयाला आली. तत्कालीन राज्यकर्त्यांकडे ही घराणी मनसबदारी मिळवू लागली. नवरात्रात अष्टमीला भवानीमातेचा जागर करावा, महानवमीला खंडेपूजन करावे आणि दस-याला प्रासंगिक पडावे, असा मराठा सरदार आणि शिलेदारांचा – विजयादशमीला सोने लुटून लढाईला बाहेर रिवाज झाला. लढाईला जायचे, तर हत्यारे सज्ज हवीत. त्यांची निगा आधीच राखायला हवी. ऐन लढाईच्या तोंडाला काही करणे शक्य व्हायचे नाही. त्यातून मग खंडेनवमीच्या शस्त्रपूजनाचे महत्त्व आणखी वाढले. शस्त्रपूजनाने यश हाती येईल, अशी श्रद्धाही दृढमूल झाली. मध्ययुगात या प्रथेला खूपच महत्त्व प्राप्त झाले.
क्षत्रिय परंपरेने आपल्या शस्त्रांचे पूजन करतात. तसे विविध व्यावसायिकही आपल्याला यंत्रांचे, हत्यारांचे पूजन करतात. कारखानदार मशिनरीचे पूजन करतात. व्यापारी वजन, तागडी पूजतात. दसऱ्यादिवशी शिलंगणाचे सोने शस्त्रास्त्रांना वाहतात. शिलंगणाचे सोने अर्पण केल्यानंतर शस्त्रपूजनाची सांगता होते.
खंडेनवमी मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा भाग आहे. आपल्या लढाऊ, शौर्यशाली परंपरेचे स्मरण करून देणारी ही खंडेनवमी मराठ्यांच्या मर्मबंधाची ठेव आहे. एकविसाव्या शतकात शस्त्र परजण्याचा मुद्दा अप्रस्तुत ठरला असला, तरी या निमित्ताने अभिमानास्पद पूर्वपरंपरेचे स्मरण होते, हेही महत्त्वाचेच म्हटले पाहिजे.
अंबाबाई मंदिर - अनेक राजवटींच्या इतिहासाचे साक्षीदार

प्राचीन स्थापत्याच्या दृष्टीने करवीरनगरीचा सुवर्णकाळ म्हणजे नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतचा काळ. या कालखंडात करवीरच्या भूमीत अनेक भव्य मंदिरांची निर्मिती झाली. राजपरिवाराच्या निवासांची निर्मितीसुद्धा याच काळात झाली असावी. तथापि, निवासाच्या इमारतीचे अवशेष सध्या दिसत नाहीत; पण त्या कालखंडातील मंदिरांची मांदियाळी करवीरनगरीच्या शिल्पवैभवाची शान अद्याप टिकवून आहे. या तीनशे वर्षांच्या कालखंडातील कोल्हापूरचे शिल्पवैभव म्हणजे श्री महालक्ष्मी मंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, मंगळवार पेठेतील ओंकारेश्वराचा मंदिर प्रकार, गंगावेसजवळचे रूपनारायण जैन मंदिर, अशी अनेक मंदिरे आज सुस्थितीत आहेत. हजार ते बाराशे वर्षांच्या काळाचे आघात सोसून विविध राजवटीमधील विविध सांप्रदायिक परंपरा पचवत कोल्हापूरचे हे शिल्पवैभव दिमाखाने उभे आहे.

प्राचीन स्थापत्याच्या दृष्टीने करवीरनगरीचा सुवर्णकाळ म्हणजे नवव्या
शतकापासून बाराव्या शतकापर्यंतचा काळ. या कालखंडात करवीरच्या भूमीत अनेक
भव्य मंदिरांची निर्मिती झाली. राजपरिवाराच्या निवासांची निर्मितीसुद्धा
याच काळात झाली असावी. तथापि, निवासाच्या इमारतीचे अवशेष सध्या दिसत नाहीत;
पण त्या कालखंडातील मंदिरांची मांदियाळी करवीरनगरीच्या शिल्पवैभवाची शान
अद्याप टिकवून आहे. या तीनशे वर्षांच्या कालखंडातील कोल्हापूरचे शिल्पवैभव
म्हणजे श्री महालक्ष्मी मंदिर, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, मंगळवार
पेठेतील ओंकारेश्वराचा मंदिर प्रकार, गंगावेसजवळचे रूपनारायण जैन मंदिर,
अशी अनेक मंदिरे आज सुस्थितीत आहेत. हजार ते बाराशे वर्षांच्या काळाचे आघात
सोसून विविध राजवटीमधील विविध सांप्रदायिक परंपरा पचवत कोल्हापूरचे हे
शिल्पवैभव दिमाखाने उभे असणारे त्रिकुटात्मक मंदिर आहे. तीनही गाभार्यांना
छत असलेला (बंदिस्त) स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिररचना
शास्त्रात अशा मंदिरांना ‘सांधार’ या नावाने ओळखले जाते. बारकाईने मंदिराचे
निरीक्षण केले तर वेगवेगळ्या शैलीतली तीन स्वतंत्र मंदिरे अत्यंत
कौशल्यपूर्वक एकमेकांना जोडून भव्य असे त्रिगुणात्मक देवतेचे त्रिकूट मंदिर
निर्माण केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या तीन स्वतंत्र मंदिरांपैकी
महाकालीचे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या तुलनेत प्राचीन वाटते. (Ambabai
Temple)
मंदिराच्या मंडोवरावरील म्हणजे बाह्य भिंतीवरील देवकोष्ठांची उंची, आकार व रचना यात खूपच तफावत दिसते. तसेच महाकाली मंदिराच्या गाभार्याचा प्रदक्षिणा मार्ग हवा खेळती ठेवण्यासाठी झरोके ठेवून बांधलेला दिसतो. शिवाय महाकाली मंदिराच्या गर्भगृहाच्या चौकटीवर सामान्यत: जिथे गणेश असतो त्या ठिकाणी कालीचेच शिल्प असलेली शिळा बसवली आहे. मंदिराच्या जगतीवरील आधारशिला या त्रिकोणी शिखरासारख्या आहेत. संभवत: दक्षिणाभिमुख कालीच्या या मंदिराची रचना उत्तराभिमुख दरवाजा असणारी असावी. महाकालीच्या या मंदिराच्या पूर्व बाजूस नुकतेच 2013 साली फरशी बदलण्याचे काम सुरू असताना एक रंगशिळा फुटलेल्या अवस्थेत सापडली. तीनही गाभार्यांना छत असलेला (बंदिस्त) स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिररचना शास्त्रात अशा मंदिरांना ‘सांधार’ या नावाने ओळखले जाते.

बारकाईने मंदिराचे निरीक्षण केले तर वेगवेगळ्या शैलीतली तीन स्वतंत्र मंदिरे अत्यंत कौशल्यपूर्वक एकमेकांना जोडून भव्य असे त्रिगुणात्मक देवतेचे त्रिकूट मंदिर निर्माण केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या तीन स्वतंत्र मंदिरांपैकी महाकालीचे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या तुलनेत प्राचीन वाटते. मंदिराच्या मंडोवरावरील म्हणजे बाह्य भिंतीवरील देवकोष्ठांची उंची, आकार व रचना यात खूपच तफावत दिसते. तसेच महाकाली मंदिराच्या गाभार्याचा प्रदक्षिणा मार्ग हवा खेळती ठेवण्यासाठी झरोके ठेवून बांधलेला दिसतो. शिवाय महाकाली मंदिराच्या गर्भगृहाच्या चौकटीवर सामान्यत: जिथे गणेश असतो त्या ठिकाणी कालीचेच शिल्प असलेली शिळा बसवली आहे. मंदिराच्या जगतीवरील आधारशिला या त्रिकोणी शिखरासारख्या आहेत. संभवत: दक्षिणाभिमुख कालीच्या या मंदिराची रचना उत्तराभिमुख दरवाजा असणारी सावी. महाकालीच्या या मंदिराच्या पूर्व बाजूस नुकतेच 2013 साली फरशी बदलण्याचे काम सुरू असताना एक रंगशिळा फुटलेल्या अवस्थेत सापडली. यावरूनसुद्धा मंदिराचे स्वतंत्र अस्तित्व एकेकाळी असावे, हेच सिद्ध होते. (Ambabai Temple)
या मंदिराचा स्वतंत्रपणे विचार करून निरीक्षण केले असता आच्छादित प्रदक्षिणा मार्ग असलेला गाभारा सुमारे तीन ते साडेतीन फुटांचे अंतराळ आणि बारा खांबावर उभा असलेला स्वतंत्र मंडप अशी याची रचना दिसते. मंडपाला पूर्व आणि पश्चिम दिशेने प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेकडील प्रवेशमार्ग मंदिराच्या एकत्रीकरणाच्या वेळी एका चिंचोळ्या मार्गिकेने मुख्य मंदिराच्या घंटाचौकास कौशल्याने जोडण्यात आला आहे. पूर्वेकडील जोडस्थानावर श्रीयंत्र बसवले आहे, तर पश्चिमेकडील बाजूवर सुमारे तीन फूट उंचीच्या चबुतर्यावर गणेशाची मूर्ती आहे. हाच गणेश पूर्वी महालक्ष्मीच्या समोर होता. तो जीर्ण झाल्यामुळे नवीन गणेशमूर्ती घडवून स्थापिली गेली व जुनी मूर्ती इथे बसवली, असे मंदिरातील जुने जाणकार सांगतात. यानंतरच्या उत्तर दिशेच्या मार्गिकेमध्ये पूर्वेकडे सप्ताश्वरथावर आरूढ सूर्य आणि पश्चिमेकडे वरुण अशा जुन्या मूर्ती अर्धभिंतीवर ठेवण्यात आल्या आहेत. हे स्थान म्हणजे मूळ महाकाली मंदिराचे मुख्य उत्तराभिमुख प्रवेशस्थान असावे.

महाकालीच्या मंदिराच्या बाह्य अंगावरील देवकोष्ठातील शिल्पे ही ‘सुरसुंदरी’ प्रकारात मोडणारी आहेत. उदा. पत्रलेखिका, मृदुंग वाजवणारी स्त्री. तर महालक्ष्मी मंदिराच्या मंडोवरावरील 64 शिल्पे ही योगिनींची आहेत. 1942 च्या सुमारास रूक्मिणी स्वयंवर नावाच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी या दोन्ही मंदिरांच्या रथिकांमधील शिल्पांची चुना व गुळाच्या पारंपरिक मिश्रणाने दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी कलाकाराच्या कल्पनेनुसार या शिल्पांपैकी काहींचे स्वरूप बदलले गेले.
महालक्ष्मीचे मंदिर हे दुमजली असून त्याचा गाभारा व त्यावरील दुसरा मजला या दोन्हींना प्रदक्षिणा मार्ग आहे. गाभार्याप्रमाणेच दुसर्या मजल्यावरसुद्धा पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना मोकळ्या खोल्या असून त्यांना बाहेरच्या बाजूस दरवाजेही आहेत. सध्या या दरवाजांमध्ये स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. या द्वारांच्या बरोबर 1942 च्या सुमारास रूक्मिणी स्वयंवर नावाच्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी या दोन्ही मंदिरांच्या रथिकांमधील शिल्पांची चुना व गुळाच्या पारंपरिक मिश्रणाने दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी कलाकाराच्या कल्पनेनुसार या शिल्पांपैकी काहींचे स्वरूप बदलले गेले.
महालक्ष्मीचे मंदिर हे दुमजली असून त्याचा गाभारा व त्यावरील दुसरा मजला या दोन्हींना प्रदक्षिणा मार्ग आहे. गाभार्याप्रमाणेच दुसर्या मजल्यावरसुद्धा पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना मोकळ्या खोल्या असून त्यांना बाहेरच्या बाजूस दरवाजेही आहेत. सध्या या दरवाजांमध्ये स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. या द्वारांच्या बरोबर मंदिराबाहेर जाते व पुन्हा याच मार्गाने मंदिरात येते. 17 व्या शतकातील रचना असल्याचा उल्लेख कोरलेल्या पूर्व दरवाजा आणि त्याहीनंतरचा दक्षिण दरवाजा अशा चार दिशांच्या चार द्वारांनी बंदिस्त महालक्ष्मी मंदिर प्रकारात सूर्याच्या चार, तर गणेशाच्या सुमारे दहा मूर्ती आहेत. दक्षिण दिशेने गणेश मंडपात प्रवेश करताना दाराच्या दोन्ही बाजूस चंद्र -सूर्याची शिल्पे आहेत, तर सरस्वती मंदिराकडे जाणार्या पश्चिमाभिमुख द्वाराजवळील वराहशिल्पाच्या मुखावर लक्ष्मीची वेगळीच मूर्ती बसवून त्या शिल्पाला वराहलक्ष्मीचे रूप देण्यात आले आहे. हे मंदिर एका रात्रीत बांधले, अशी आख्यायिका आहे. लेखाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे नवव्या शतकापूर्वीपासून महालक्ष्मीचे स्थान इथे होते; पण नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या कालखंडात मंदिराच्या स्थापत्याचा विकास झाला. देवीच्या भक्तांची संख्या खूपच वाढली. पूर्वी फारसे ज्ञात नसणारे क्षेत्र तीर्थधाम म्हणून प्रसिद्धीस आले. देवीच्या कृपेने 300 वर्षांची अंधकारमयी रात्र संपून नगरीच्या भाग्याचा सूर्योदय मंदिराच्या पूर्ततेनंतर झाला. अशा अर्थाने हे रूपक वापरण्यात आले.
दुर्ग नावाच्या राक्षसाला मारणारी म्हणून ‘दुर्गा’
प्रसिद्ध शक्तीदेवता. दुर्ग नावाच्या राक्षसाला मारणारी म्हणून दुर्गा. नऊ वर्षाच्या शक्तिदेवीला दुर्गा म्हणावे असे देवी भागवतात (३·२६) म्हटले आहे. ही उमा, गौरी, पार्वती, चंडी, काली इ. रूपांनी ओळखली जाते. (Goddess Durga) ते शंकर, यम, विष्णू,णूचंद्र, इंद्र, वरुण, भूमी सूर्य इ. देवतांच्या अंशांपासून दुर्गेचा जन्म झाला, असे मार्कंडे पुराणात म्हटले आहे. महाभारताच्या विराटपर्वात (अध्याय ६) दुर्गा नारायणाची स्त्री असल्याचे म्हटले आहे. महाभारतात (भीमपर्व २३) दुर्गा देवीचे एक स्तोत्र आहे. या देवीचे स्थान विंध्य पर्वतावर असल्याचे हरिवंशात म्हटले आहे. त्यावरून या देवीला विंध्यवासिनी असेही म्हणतात. दुर्गेचा संबंध शंकराशी जोडला असून तिला आदिशक्ती असे म्हटले आहे. ‘नवदुर्गा’ नावाचे एक स्तोत्र असून त्यात दुर्गेच्या नऊ रूपांची वर्णने आहेत. आगमग्रंथात नवदुर्गांची नावे दिलेली आहेत. (Goddess Durga)
मार्कंडेय पुराणात (अध्याय ८१–९३) देवीमाहात्म्य आले असून त्यातील श्लोकांची संख्या ७०० असल्यामुळे हा भाग‘दुर्गा सप्तशती’
या नावाने प्रसिद्ध आहे. यात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तीन स्वरूपात दुर्गेचे चरित्र वर्णन केले आहे. ही तीन रूपे
अनुक्रनुमे तम, रज व सत्त्व या तीन गुणांची प्रतीके आहेत. मधुकैटभ, महिषासुर, चंडमुंडमुं, शुंभनिशुंभ इ. राक्षसांचा तिने आपल्या
पराक्रमाने वध केल्याच्या कथा यात सांगितल्या आहेत. दुर्गेने देवांना
उत्पन्न केले, सर्व विद्या दुर्गा स्वरूप आहेत, ती ओंकाररूप आहे, जेव्हा
धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा दुर्गा अवतार घेते, असेही वर्णन तेथे आढळते.
दुर्गा देवीने हा पराक्रम आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवसांत केला म्हणून नवरात्रात दुर्गा देवीचा मोठा उत्सव करतात.
दुर्गेला चंडी असेही दुसरे नाव आहे, म्हणून दुर्गासप्तशतीच्या पाठास ‘चंडीपाठ’ असे म्हणतात. सप्तशतीचा पाठ करून हवन
करण्याची पद्धती आहे. शतचंडी, सहस्रचंडी अशा मोठ्या संख्येनीही सप्तशतीचा पाठ करतात. दुर्गेच्या उपासनेत पशुबशुलीही
सांगितला आहे. दुर्गेच्या पूजेचे विधान देवीभागवत, देवीपुराण, कालिकापुराण
तसेच इतर पुराणांतही आढळून येते. ते प्रत्येक महिन्याच्या शुद्ध अष्टमीस
दुर्गाष्टमी म्हणतात. या दिवशी स्त्रिया व्रत करतात. आश्विन महिन्यातील
दुर्गाष्टमीला महाअष्टमी म्हणतात. त्या दिवशी महालक्ष्मीची पूजा, चंडीपाठ,
जागरण इ. अनेक विधी करावयाचे असतात. नवरात्रोत्सवात दुर्गा पूजेला एक
महत्त्वाचे स्थान आहे. दूर्गा पूजेच्या अनेक पद्धती भारतातील वेगवेगळ्या
प्रांतात प्रचलित आहेत.
दुर्गेची रौद्र व सौम्य अशी दोन्ही रूपे आहेत. रौद्ररूपात ती तांत्रिकाची उपास्य देवता ठरली. दुर्गेचे अध्यात्मरूप म्हणजे सौम्यरूप देव्युपयु निषदात वर्णिले आहे. दुर्गा पुष्कळवेळा शक्तिरूपातच प्रकट झालेली आहे. कोलकात्यात दुर्गा ही काली आहे. तर गोमंतकात ती शांता आहे. चंडी या स्वरूपात दुर्गा ही चतुर्भुजा, अष्टभुजा, दशभुजा, अष्टादशभुजा अशी आढळते. ते तिच्या हातांत चक्र, पाश, शूल, खड्ग इ. आयुधे असतात. ही सिंहारूढ असते. ते सुप्रसुभेदागमानुसार दुर्गा ही विष्णूची धाकटी बहीण असून ती आदिशक्ती आहे. जेव्हा ती अष्टभुजा असते, ते तेव्हा तिच्या हातात शंख, चक्र, शूल , धनुष, बाण, खड्ग, खेटक (गदा) व पाश ही आयुधे असतात. दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांतील मूर्ती आढळून येतात. महिषासुरमसुर्दिनीच्या रूपात तिच्या पायाजवळ शिर तुटतुलेला महिषासुर असतो आणि त्याच्या मानेपासूनसू जन्मलेला पुरुष दाखविलेला असतो.
शिवकालीन शस्त्रास्त्रे !
खंडेनवमी निमित्त देशभरात शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. त्यानिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्रांबाबत विशेष लेख.
देवांविरुद्ध राक्षसांचे घनघोर युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले. दहाव्या दिवशी पार्वती देवीचा विजय होऊन काशीमध्ये प्रवेश झाला. तोच आश्विन शुद्ध दशमीचा दिवस. याच दिवशी शमी वृक्षाची पूजा करून घरातील कर्त्या पुरुषाकडून आपट्याची पाने वाहून शस्त्रांचे विधिवत पूजन केले जाते. ( Navratri 2023 Khandenavmi )
वशिष्ठ धनुर्वेदात दगड, काठी, मुसळ, पाश, शिंगे याने लढणे प्रचलित होते. त्यास शिलाकाल म्हटले गेले विश्वामित्रांच्या काळात तलवार, भाला, नारसिंहळ (कट्यार), सांग, गदा, माडू, धनुष्यबाण ही शस्त्रे प्रचलित झाली. मुघल काळात वक्र पात्याच्या व साध्या मुठीच्या पर्शियन किरच किंवा किलीन तलवारी भारतात तयार होऊ लागल्या. त्यास ‘इंडो पर्शियन’ म्हणतात.
डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, अबिसियन यांनी आणलेली पाती व भारतीय मुठी यापासून भाला प्राचीन काळापासून शिकार व युद्धासाठी वापरले. तलवारी बनू लागल्या. त्यास ‘अँग्लो इंडियन’ म्हणतात. भारतात वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या तलवारी तयार होत असत. त्या-त्या भागातील नैसर्गिक वैशिष्ट्यांचा, परंपरांचा व कलाकारांचा प्रभाव बनावटीत दिसून आला. ओडिशाचा खांडा, मराठ्यांची धोप, पंजाबी तेगा, कुर्ग तलवारी होत्या, ती या भागात प्रभावी शस्त्रे होती.
खांडा
खांडा सरळ, उंच व दुधारी असे. खांड्यास घुमावदार पकड असणारी, मुल्हेरी मूठ असे. मजबुतीच्या दृष्टीने खांड्याच्या मागील पानावर दुहेरी नक्षीचे पाते चढविले जात असे. त्यामुळे खांडा वजनदार व भारी असे.
धोप
हातातील जोर सामर्थ्याने प्रकट करणारी तलवार म्हणजे धोप. मराठ्यांचे सर्वात आवडीचे शस्त्र. धोप तलवार सरळ पात्याची सुळसुळीत, लवचिक असलेली प्रामुख्याने घोडदळाचे मुख्य शस्त्र होते. धोपेचे पाते नखापासून पुतळ्यांमधून गजामध्ये जोडले जात असे. त्यामुळे मजबुती जास्त होती. बोटाच्या संरक्षणासाठी परज असल्याने शत्रूचा वार सरकून खाली आला तरी इजा करीत नसे. पात्यावरती नाळ असल्याने पाठ कठीण असे. लांबूनच वार करून शत्रूला जायबंदी करण्यासाठी धोपेची लांबी ४० ते ५० इंचांपर्यंत ठेवली जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुळजा भवानी व जगदंबा नावाच्या तिन्ही तलवारी धोप पद्धतीच्या होत्या.
पट्टा
संस्कृतमध्ये पट्ट या शब्दाचा अर्थ सरळ असा होतो. पालथ्या हातामध्ये ठिकठाक बसेल, अशा पोलादी आवरणात सरळ दुधारी लवचिक पाते बसविले जात असे. त्यास पट्टा असे संबोधले गेले. मुरारबाजी, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, रामजी पांगेरा या मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार म्हणजे पट्टा. छत्रपती शिवरायांच्या पट्ट्याचे नाव ‘यशवंत’ होते.
ढाल
संरक्षणासाठी प्रभावीपणे वापरलेले शस्त्र म्हणजे ढाल होय. शरीरकवच, हलकेपणा, चिवटपणा हे ढालीचे गुण आहेत. ढाली म्हैस, हरण, बारसिंगा, गेंडा, हत्ती, उंट यांचे कातडे कमावून बनविल्या जात.
विटा
मुक्तामुक्त प्रकारातील भाल्याच्या जातकुळातील एक शस्त्र म्हणजे ‘विटा’. शिवकालात मराठ्यांनी लांबूनच शत्रू मारण्यासाठी एक अस्त्र शोधून काढले. त्यास ‘विटा’ संबोधले गेले.
भाला
प्रासंगिक जाणारे शस्त्र म्हणजे ‘भाला’. अश्वकुंत- घोडदळातील भाले, गजकुंत- हत्तीस्वारांचा भाला, पदातीकुंत- पायदळातील भाला, असे तीन प्रकार आहेत.
गुरज
गुर्ज गुरज म्हणजे गदा, भारत खंडातील लोक यास गदा म्हणतात. तलवारीच्या मुठीत पोलादी गज बसवून पुढे कुन्हाडीप्रमाणे पाते लावलेली गदा बसविली जाते. त्यास गुरज म्हणतात. शरीराचा कठीण भाग, ढाल, चिलखत फोडण्यासाठी हे शस्त्र वापरत असत.
वाघनखे
वाघनखे हे खऱ्या अर्थाने एक गुप्त किंवा छुपे शस्त्र आहे. सभासद बखर व जेधे शकावलीत छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला मारण्यासाठी या शस्त्राचा वापर केला. वाघाच्या नखांसारखी अणुकुचीदार पोलादी पाती, पोलादी पट्टीवर बसवून वरच्या बाजूस अंगठीच्या आकाराच्या दोन कड्या बसविल्या जातात.
माडू
काळविटाच्या शिंगास अणुकुचीदार पोलादी फाळ बसवून मध्यभागी लहानशी ढाल अशी रचना असलेले शस्त्र म्हणजे माडू होय. दाक्षिणात्य लोकांनी या शस्त्राचा वापर जास्त प्रमाणात केला. माडूचे हात करताना परजण्यासाठी अग्रभागी असलेल्या टोकांचा वापर केला जातो. ( Navratri 2023 Khandenavmi )
– संदीप सावंत, (शिवकालीन शस्त्रसंग्राहक आणि अभ्यासक, कोल्हापूर )
मोहटादेवीला तांबूल प्रसाद प्रिय !

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : मोहटादेवीला भाविकांकडून विविध प्रकारचे नैवेद्य व प्रसाद अर्पण केला जातो. यामध्ये प्रामुख्याने आगळा वेगळा आणि देवीला अतिशय प्रिय असणारा तांबूल प्रसाद तयार करण्यासाठी देवस्थान समिती व महिला भाविकांची लगबग सुरू आहे. तांबूल प्रसाद करण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आजही देवस्थान समितीकडून सुरू आहे. माहूरच्या रेणुका मातेला मोठ्या प्रमाणात तांबूलचा प्रसाद अर्पण करून तो भाविकांना वाटला जातो. मोहटादेवी हे माहूरच्या रेणुकामातेचे अंशात्मक स्वयंभू स्थान आहे. त्यामुळे मोहटादेवीलाही तांबूलच्या प्रसादाचे महत्त्व प्राप्त आहे. तांबूल प्रसाद तयार करण्यासाठी प्रामुख्याने नागिणीचे पान व इतर 14 प्रकारचे पदार्थ टाकले जातात. त्यामध्ये कात, चुना, सुपारी, ज्येष्ठमध, बडीशेप, धना डाळ, गुलकंद, आसमानतारा, लवंग, विलायची, गुंजपाला, खोबर्याचा किस, जायफळ या पदार्थांबरोबर नागिणीचे पान खलबत्त्यामध्ये कुटून त्याचा बारीक भुगा केला जातो. तो होणारा भुगा म्हणजे देवीचा अतिशय प्रिय असणारा तांबूल प्रसाद होय.
अनेक भाविक तांबूलचा प्रसाद तयार करण्यासाठी नागिणीचे पान व इतर पदार्थ देवीचरणी अर्पण करतात. या सर्व पदार्थांचे एकत्रित मिश्रण करण्याचे काम देवस्थान समितीकडून होते. घटी बसणार्या महिला भाविक व ब्राह्मण पुजारी यांच्या कुटुंबातील महिला देवीची गाणी म्हणत देवीचा तांबूल प्रसाद मोठ्या भक्तीभावाने तयार करतात. नवरात्र उत्सवात पहिल्या माळेपासून ते पौर्णिमेपर्यंत या पंधरा दिवसाच्या कालावधीत तांबूल प्रसाद रोज मोहटादेवीला ठेवला जातो. दरम्यान, सहाव्या व सातव्या माळ्याच्या निमित्ताने मोहटादेवी गडावर देवीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह विविध भागातून भाविक पायी चालत मोहटादेवी गडावर गर्दी करत आहे. अहमदनगर येथील देवीभक्त वाहतूक व्यावसायिक राजू बलभीम सानप यांनी मोहटादेवीच्या मंदिर गाभार्यात आकर्षक अशी सुंदर फुलांची सजावट केली आहे.
आम्ही सर्व महिला भगिनी देवीचा प्रिय असणारा तांबूल प्रसाद करतो. यामध्ये स्वयंस्फूर्तीने आमचा सहभाग असतो. यानिमित्ताने देवीची सेवा घडते.
– मंजुषा भूषण साकरे
आयुध नवमी

आयुध नवमी यास आपर खंडेनवमी म्हणतो. प्रामुख्याने या दिवशी ‘शस्त्र पूजन’ होते. वास्तवात आपल्याकडे शस्त्रपूजन अनेकवेळा होत असे. युद्धाच्या वेळी, विजय प्राप्त झाल्यानंतर शस्त्रपूजन प्रथा प्राचीन काळापासून आहे असे म्हणू शकतो. (Khandenavami 2023)
संपूर्ण भारतामध्ये खंडेनवमीच्या या दिवशी शस्त्रपूजा होत नाही. उत्तर भारतामध्ये या दिवशी सरस्वतीचे पूजन होते तर दख्खन आणि दक्षिण भारतात शस्त्रास्त्रे पूजा होते. या संदर्भात अनेक पुराण कथा जोडलेल्या आहेत. ‘खंडेनवमी’ हा मराठी शब्द असून, याचा संबंध तलवार सदृश हत्याराशी आहे. त्यात विशेषतः खांडा नावच्या तलवारीचे पूजन केले जाते. (Khandenavami 2023)
महिषासूर व दुर्गा यांच्यातील युद्ध हे नऊ दिवस नऊ रात्री चालू होते. ज्यावेळी महिषासूराचा वध झाला. त्यानंतर देवीने आपली शस्त्रास्त्रे स्वच्छ करून विधिवत पूजन केले, युद्धात ज्या शस्त्रांच्या जोरावर आपण युद्ध करतो किंवा विजयश्री प्राप्त करतो त्या शस्त्रांचे आदर युक्त पूजन करून सतत विजय मिळावा म्हणून आयुध नवमी या दिवशी हा विधी केला.
पांडवांना आपल्या राजवैभवांचा त्याग करून आज्ञातवास भोगावा लागला होता, त्यावेळी अर्जुनाने सर्व शस्त्र, अस्त्रे ही शमीच्या झाडावर ठेवली होती. कालांतराने अर्जुनाने याच दिवशी अज्ञातवास संपवून आपली शस्त्रे परत मिळवली होती, असा महाभारतात उल्लेख आहे. पूर्वी आपल्याकडे अनेक राजवटी होऊन गेल्या व अनेक ठिकाणी संस्थानिक, राजेशाही होती. याच आयुध नवमी दुसऱ्या दिवशी सीमोल्लंघन हा विधी साजरा केला जात असे, विशेषतः करून राजघराण्याशी हा विधी म्हणजे कुळाचार किंवा कुळधर्म मानला जाई. या दिवशी सीमा, कार्यक्षेत्र, राजवट, सत्ता वाढविण्यासाठी युद्ध, आक्रमण, लढाई केली जात असे त्यामुळे यास सामाजिक, धार्मिक, राजकीय महत्त्व आहे याचबरोबर विजयादशमी हा साडेतीन सुमुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी महत्त्वाची कार्ये सुरू करायची प्रथा आहे.
शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर पावसाळा संपून हिवाळा चालू होण्याची प्रक्रिया असते. थोडक्यात, ऋतुमान बदलते.. पावसाळ्यामध्ये शस्त्रास्त्रे कमी हाताळणी होते किंवा या चार महिन्यांत युद्ध, आक्रमणे, लढाई कमी प्रमाणात होते. या हवामान मध्ये शस्त्रास्त्रांना गंज चढण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात होते. त्यामुळे प्रामुख्याने खंडेनवमीआधी सर्व शस्त्रास्त्रे ही शिकल करण्यासाठी दिली जात किंवा स्वत: शिकल केली जातात. (शिकल म्हणजे स्वच्छ, गंज काढणे, तेल-पाणी करणे, धार करणे) त्यानंतर शस्त्रास्त्रे पूजन केले जात पुन्हा युद्ध, आक्रमणे, लढाई यास सुरुवात सहसा या सुमुहूर्तावरच लढाईसाठी बाहेर पडत.
शस्त्र पूजन कालांतराने सर्वच वर्गातल्या लोकांना महत्त्वाचे ठरले असे दिसते, शेतकरी शेतीची अवजारे पूजन करू लागले तर स्वयंपाकघरामधील विळ्या, चाकू, माप, मुसळ अशा वस्तूंही पूजनात आल्या, सध्या या विधीचे स्वरूप खूपच पालटल्याचे दिसते आहे. थोडक्यात, जी वस्तू आपल्यासाठी ज्या वस्तूने आपली प्रगती होते किंवा जी वस्तू आपल्या प्रगतीचे द्योतक आहे. अशा वस्तूंचे ही पूजन करण्यासाठी प्रथा सध्या आपल्याकडे सुरू आहे.
खंडेनवमी विशेष : शौर्यशाली वारसा सांगणारे शस्त्रागार...
नवरात्र उत्सवातील महानवमी तिथीला खंडेनवमी म्हटले जाते. ‘खंडे’चा मूळ शब्द खांडा म्हणजेच खड्ग किंवा तलवार होय. सैनिकी परंपरा जपणारे किंवा शस्त्रास्त्रे धारण करणारे सर्व समाज खंडेनवमीचा सण साजरा करतात. शौर्यशाली परंपरेचा वारसा सांगणारे अनेक शस्त्रागार ‘देशभरात आहेत. ‘शाहूनगरी’ कोल्हापुरातील न्यू पॅलेसमधील छत्रपती शहाजी वस्तुसंग्रहालय आणि टाऊन हॉल उद्यानातील कोल्हापूर वस्तू संग्रहालयातील शस्त्रागार लक्षवेधी आहेत. खंडेनवमीनिमित्त या शस्त्रागारांबद्दल थोडे….. (Khandenavami 2023)
टाऊन हॉल संग्रहालयातील शस्त्रदालन
इसवी सन १९४५-४६ च्या दरम्यान कोल्हापुरातील प्राचीन ब्रम्हपुरी टेकडीवर कोल्हापूर संस्थानचा पुरातत्त्व विभाग व डेक्कन कॉलेज पुणे यांच्या वतीने उत्खनन करण्यात आले. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे जतन कोठे करायचे? या प्रश्नातून संग्रहालयाची संकल्पना पुढे आली आणि ३० जानेवारी १९४६ ला कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली. १९४९ मध्ये टाऊन हॉल उद्यानातील ‘कोल्हापूर नगर मंदिर’ येथे हे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्यात आले. कोल्हापुर नगर मंदिर (टाऊन हॉल) ही वास्तू इसवी सन १८७२ ते ७६ या कालावधीत रॉयल इंजिनिअर सी मॉट यांच्या देखरेखेखाली गाँधीक वास्तूशास्त्रानुसार बांधण्यात आली. सार्वजनिक कारभारासाठी याचा वापर होत होता.
संग्रहालयात पुरातत्त्व दालन, धातू वस्तू दालन, शिल्प दालन, संकीर्ण
दालन, व्यक्तिचित्र दालन, पुतळे दालन यासह शस्त्रास्त्र दालनाचाही समावेश
आहे. शस्त्रास्त्रे दालनात मध्ययुगापासूनची प्रहार आणि संरक्षण करणारी
शस्त्रास्त्रे आहेत. यात तोफा, तोफगोळे, तलवारी, ढाली, बंदुका, भाले आदींचा
समावेश आहे. न्यू पॅलेस संग्रहालयातील शस्त्रागार छत्रपती घराण्याचे
ऐतिहासिक महत्त्व लोकांना कळावे आणि लोकराजा राजर्षी शाहू महारांच्या
कार्याच्या स्मृती अखंड राहाव्यात, या उद्देशाने छत्रपती शहाजी महाराजांनी
नव्या राजवाड्यात
शहाजी छत्रपती म्युझियमची स्थापना केली.
राजर्षी शाहू महाराजांच्या जन्म शताब्दीनिमित्त ३० जून १९७४ रोजी हर हायनेस सौ. प्रमिलाराजे छत्रपती महाराणीसाहेब यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. संग्रहालय १२ दालनात विभागले आहे. यात प्रवेश दालन, अंबारीचे दालन, मिरवणुकीतील वस्तूंचे दालन, छत्रपती दालन, छत्रपती शाहू दालन, संकीर्ण कलाकृती दालन, ऐतिहासिक चित्र दालन, कलात्मक चित्र दालन, दरबार हॉल, लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती दालन, शिकार दालन यासह शस्त्रास्त्र दालनाचा समावेश आहे. शस्त्रास्त्र दालन संग्रहालयातील महत्त्वाचा भाग असून यात शिवकालापासूनच्या विविध प्रकारच्या तलवारी, पट्टा, दांड, भाले, कट्यारी, खंजीर, धनुष्यबाण, कुल्हाड़ी, बाणा, विटा, गुर्ज, वाघनखे, चिलखते, सैनिकी पोशाख, तोफा, बंदुका, साठमारीची हत्यारे अशा लहान-मोठ्या शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. (Khandenavami 2023)
खंडेनवमी विशेष : शौर्यशाली वारसा सांगणारी 'ही' आहेत मराठाकालीन शस्त्रास्त्रे
कोल्हापूर : प्राचीन भारतीय कृषी संस्कृतीच्या नवरात्र उत्सवातील महानवमी या तीथीला खंडेनवमी म्हणतात. खंडेचा मूळ शब्द खांडा म्हणजेच खङ्ग किंवा तलवार होय. सैनिकी परंपरा जपणारे किंवा शस्त्रास्त्रे धारण करणारे सर्व समाज खंडेनवमीचा सण विविधतेने साजरा करतात. किंबहुना विजयादशमी सीमोल्लंघनाची सुरुवात शस्त्रास्त्रांच्या पूजनानेच होते. शौर्यशाली वारसा सांगणारी मोठी परंपरा मराठा साम्राज्याला लाभली आहे.
शिवछत्रपतींच्या दूरद़ृष्टी व बुद्धिचातुर्याच्या मार्गदर्शनाखाली मराठा साम्राज्याची सैनिकी परंपरा आणि त्यांच्या प्रभावी शस्त्रास्त्रांचा विकास झाला. या शौर्यशाली वारशाच्या पाऊलखुणा शस्त्रांच्या रूपाने विविध वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतात. राजघराणी, सरदार-जहागिरदार, खासगी संग्राहक व इतिहास संशोधक-अभ्यासकांकडेही शस्त्रास्त्रे आहेत.
तलवार : अत्यंत प्रभावी शस्त्र. जगातील अनेक राष्ट्रांच्या ध्वजावर, बोधचिन्हांवर, नाण्यांवर, चित्रांमध्ये तलवारींना विशेष स्थान आहे. शूरवीरांच्या सन्मानासह लग्न व धार्मिक समारंभात तलवार पूजनीय आहे. राजवटीनुसार तलवारींचे विविध प्रकार निर्माण झाले. तलवारीच्या मुठीवरून सुमारे 40 उपप्रकारांसह नख्या, खजाना, ठोला, परज, गंज्या, नाळ अशा तब्बल 22 भागांत तिची विभागणी होते. मराठा तलवार अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आली होती.
कट्यार : छोट्या शस्त्रांपैकी सर्वात प्रभावी असणार्या कट्यारीचा उगम महाराष्ट्रात झाल्याने हे मराठा शस्त्र म्हणून ओळखले जाते. मराठा सैनिकाच्या कमरेला शेल्यात कट्यार असायची. कट्यारीचे बिचवा, खान्ज्राली, खंजीर, पेशकब्ज, किंदजल, कुकरी, जांबिया, कर्द असे विविध प्रकार आहेत. मराठा पद्धतीची कट्यार अखंड ओतलेली (जोड नसलेली) 10 ते 20 इंच लांब मजबूत असते. मानकर्यांच्या कट्यारीवर सोन्याचांदीचे कलाकुसर तर स्त्रिया व मुलांकरिता लहान आकाराच्या वजनाला हलक्या असायच्या. मराठा समाजात लग्नसमारंभात कट्यारीच्या साक्षीने क्षात्रधर्म न विसरण्याची शपथ घेतली जाते.
वाघनख : सर्वात लहान पण अत्यंत प्रभावी छुपं शस्त्र. अफझलखानाला शिवछत्रपतींनी याच शस्त्रास्त्राने ठार मारले. प्रत्येक मराठा सैनिकाकडे वाघनख असायचेच. लढाईबरोबरच जंगल, सह्याद्रीच्या कडे-कपार्यातील मार्गावरून, गडकोटांच्या तटा-बुरुजांवर आणि उंच झाडांवर चढाई करण्यासाठी वाघनखांचा अत्यंत महत्त्वपूर्ण वापर केला जायचा.
विटा : भाल्याच्या कुळीतील विटा हेही एक मराठा अस्त्र म्हणून ओळखले जाते. बुमरँगप्रमाणे शत्रूवर आघात करून परत येणारे हे शस्त्र. शिवकाळात मराठा सैन्यात तिरंदाज व भालाईताप्रमाणेच विटेकर्यांची स्वतंत्र तुकडी असायची. दहा तलवारधार्यांवर एक पट्टेकरी भारी, तर दहा पट्टेकर्यांविरोधात एक विटेकरी भारी असे समीकरण होते. काठी, पोलादी टोक आणि दोरीचा वापर करून तयार केलेल्या या शस्त्रास्त्राच्या साहाय्याने 15 ते 20 फुटांवरील किंवा हत्ती-घोडे व उंटावरील शत्रूसैनिक टिपला जायचा.
पट्टा : पट्टा या शस्त्राचा वापरही मराठा सैन्यात मोठ्या प्रमाणात झाला. उव्या हातात पट्टा व डाव्या हातात दांड घेऊन शत्रू सैनिकांना दूर ठेवून त्यांच्यावर वार करण्यासाठी या शस्त्राचा प्रभावी वापर झाला. पट्टा घडवतानाही अनेक महत्त्वपूर्ण बदल शिवछत्रपतींच्या शस्त्रागारात केले होते.
कुर्हाड, भाला, गोफण
मराठा सैन्यात बहुतांशी शेतकरी असायचे, यामुळे त्यांची शस्त्रे दोन्ही कामांना उपयोगी ठरणारी होती. कुर्हाड, भाला, गोफण या शस्त्रांचा यात समावेश होता. डोंगरदर्याच्या उंच-सखल भागातून चालताना भाल्याचा, जंगलातून चालताना कुर्हाडीचा आणि शेतीकामासह दूरवर असणार्या शत्रूला टिपण्यासाठी गोफणीचा वापर केला जायचा.
शुभ विजयादशमी
कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी दसरा अर्थात विजयादशमी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाचे महत्त्व सांगणारे अनेक दाखले पुराणात आढळतात. वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सत्प्रवृत्तीचा विजय हे तत्त्व विविध कथांमधून व्यक्त होते. संघर्ष नेहमी चांगल्या आणि वाईट शक्तीत होतो आणि यामध्ये विजय नेहमीच चांगल्या शक्तीचाच होतो, हाच संदेश विजयादशमी साजरा करण्यामधून व्यक्त होत असतो.
नवरात्राचे नऊ दिवस सरले की, आश्विन शुद्ध दशमीला देशभरात दसरा अर्थात विजयादशमी साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस कुठल्याही चांगल्या, नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाचे महत्त्व सांगणारे अनेक दाखले पुराणातील कथांमध्ये सापडतात. याच दिवशी श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून सीतामातेला त्याच्या जोखडातून मुक्त केले. त्याचे स्मरण म्हणून आजही गावोगावच्या मैदानावर रावणाचे पुतळे जाळून विजयोत्सव साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सत्प्रवृत्तीचा विजय म्हणून हे प्रतीकात्मक दहन केले जाते.
महाभारतात पांडवांनी 12 वर्षे वनवास व 1 वर्षे अज्ञातवास संपवून आपली लपवलेली शस्त्रास्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीतून परत काढली. या विरांना शस्त्रास्त्रे परत देऊन विजयाचे रणशिंगच जणू या वृक्षाने फुंकले होते. त्यामुळे दसर्याच्या दिवशी शमी वृक्षाचे महत्त्व अधिक मानले जाते. दैवत भावाने या वृक्षाची पूजा केली जाते. ‘शमी शमयाते पापम् शमी लोकहितकांतका। धरिण्यार्जुनगणानाम् रामस्य् प्रियवंदिनी॥ क्रिशमान्यत्रया यथाकाल सचम्या। तारा निर्विघ्नकर्ती त्वाम् भव् श्रीरामपुजीते॥’ अर्थात, शमी वृक्ष हा वाईट प्रवृत्ती स्वच्छ करतो. त्याचे काटे लालसर रंगाचे असतात आणि प्रभू रामचंद्रांचा हा आवडता वृक्ष आहे. याच झाडावर पांडवांनी त्यांची शस्त्रे लपवली होती. ‘हे शमी, प्रभू रामचंद्रांनी तुझी पूजा केली. मी आता माझ्या विजय प्रवासाला सुरुवात करत आहे. तू माझा मार्ग आनंददायी आणि संकटमुक्तकरशील, असा विश्वास वाटतो.’ शमी वृक्षाला या दिवशी अशा प्रकारे प्रार्थना केली जाते.
दसर्यादिवशी आपट्याच्या वृक्षाचेही पूजन केले जाते. वरतंतू ऋषी, त्यांचा शिष्य कौत्स आणि रघुराजा यांची कथाही पुराणात आहे. रघुराजाने कौत्साला दिलेले सुवर्ण मोहोरांचे दान कौत्स आपल्या गुरूंना म्हणजे वरतंतू ऋषींना देतो; मात्र ते शिष्याच्या गुणांनीच संतुष्ट असतात. ते गुरुदक्षिणा नाकारतात. कौत्सही हे धन घेऊ शकत नाही व दान केलेले धन रघुराजाही घेऊ शकत नाही. त्यामुळे हे धन एका आपट्याच्या झाडाखाली ठेवून तमाम जनतेला ते लुटायला सांगतात. हा दिवस दसर्याचा असल्यामुळे या दिवशी आजही आपट्याच्या वृक्षाचे पूजन करून त्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात. या देवाणघेवाणीतून खूप मोठा संदेश दिला आहे. आपण दान केलेल्या संपत्तीचा मोह धरू नये. गुरू, शिष्य व राजा या तिन्ही नाट्यातले आदर्शही या कथेतून व्यक्त झालेले दिसतात.
या दिवशी आपट्याच्या वृक्षाची पूजा करताना पुढील मंत्र म्हणतात, ‘अश्मांतक महावृक्ष महादोषनिवारणम्। इस्तना दर्शनम् देही कुरू शत्रूविनाशनम्॥’ याचा अर्थ, हे महान वृक्ष अश्मंतक अर्थात आपटे तू मोठ्यातील मोठ्या अडचणींवर मात करतोस. माझ्या मित्रांशी मला जवळ आण आणि माझ्यातील दोषांचे निरसन कर,’ असा आहे.
विजयादशमीचा दिवस आई दुर्गेचा विजयोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. नऊ दिवस अखंडपणे शुंभ-निशुंभ, रक्तबीज, म्हैषासुर आदी राक्षसांना मारून या पृथ्वीला तीने भयमुक्त केले. या नऊ दिवसांच्या युद्धाची सांगता म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी देवीची अर्थात स्त्री शक्तीच्या पूजेची सांगता केली जाते. विजयादशमीपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी विश्रांती घेते, असेही मानले जाते.
दसरा हा दिवस सर्वार्थाने यशाचा व विजयाचा दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी आपणही घरात मंगल तोरण लावतो. आपल्या यंत्र सामग्रीची पूजा करतो. यांच्या सहाय्यानेच मला पुढच्या यशासाठी मार्गक्रमण करायचे आहे. त्यामुळे यांची साथ लाभू दे, असा एक भाव या पूजेमधून व्यक्त होतो. विजयादशमीच्या दिवशी आपण सीमोल्लंघनही करतो. पूर्वी राजे-महाराजे या दिवसाचा मुहूर्त साधून लढाईसाठी कूच करत असे आणि आपली सीमा ओलांडत असत. आज पूर्वीसारखी प्रत्यक्ष युद्धे नाहीत. देवीने राक्षसांना मारून मानवाला भयमुक्त केले; मात्र आपल्या मनातील षड्रिपूरूपी राक्षस अर्थात शत्रूंचे बळ वाढलेले दिसते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यासारख्या वृत्ती वाढल्यामुळे माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतीच्या दडपणाखाली वावरत असतो. हे दडपण मनातून जाण्यासाठी मनाचे सीम्मोलंघन करणे गरजेचे बनले आहे.
यंदा विजयादशमीच्या निमित्ताने आपण आपल्या मनाचे सीम्मोलंघन करू या. मनातील द्वेषाची, शत्रुत्त्वाची, क्रोधाची भावना काढून, बंधुत्वाची, आपलेपणाची समाधानाची भावना वाढीस लावू या. म्हणजे, स्वत:तील शत्रूंवर विजय मिळवून खर्या अर्थाने विजयोत्सव साजरा करण्याचा आनंद मिळेल.
रुढार्थाने सीमोल्लंघन म्हणजे रावणाच्या प्रतिकृतीचे दहन असे वाटत असले, तरी त्यामध्ये बराच अर्थ दडलेला आहे. रावणाचे दहन म्हणजेच दुष्ट, वाईट प्रवृत्तींचे दहन. सृष्टीत कितीही वाईट शक्ती असल्या, तरी त्यांना नीतिमत्तेपुढे नतमस्तक व्हावेच लागते, असे आपला सांस्कृतिक इतिहास सांगतो. रावण हा अतिशय बलाढ्य होता. अजेय होता. त्याने समस्त देवांना, ग्रहांना आपल्या मुठीत ठेवले होते. साक्षात भगवान शंकरांना त्याने प्रसन्न केले होते; पण कालांतराने मिळवलेल्या सर्व शक्तींचा त्याला अहंकार जडला. त्याची नीतिमत्ता भ्रष्ट झाली. तो ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. अहंकाराच्या धुंदीने त्याची विवेकबुद्धीही चेतनाहीन झाली. त्याने साक्षात जगदंबेला म्हणजे सीतामाईला बंदी बनवले. अखेर प्रभू श्रीरामचंद्रांना या अहंकाराने उन्मत्त झालेल्या रावणाचा नाश करावाच लागला.
हा इतिहास म्हणजे केवळ कथा नाही, तर सर्वसामान्य माणसासाठी आखून दिलेला नीतीपाठ आहे. समाजातील वाईट शक्तींवर सदाचाराने, नीतीने विजय मिळवता येतो, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणूनच प्रभू रामचंद्रांना पुरुषोत्तम असे म्हटले जाते. दसरा हा आपल्यातील चांगल्या शक्तींवर विश्वास ठेवला पाहिजे, या गोष्टीची आठवण करून देतो.
मोरगावचा ऐतिहासिक राजेशाही मर्दानी दसरा

मोरगाव :
कर्हातीरी नांदतो मोरया देवराव । चला जाऊ यात्रेचे महापुण्य आहे ।
मनी इच्छिले मोरया देत आहे ॥
दसरा-विजयादशमी हा समस्त मोरगाववासीयांचा आनंद सोहळा असतो. मोरगाव (ता.
बारामती) येथील राजेशाही दसरा छत्रपती शाहू महाराज सातारकर यांच्या
आज्ञेनुसार सुरू आहे. मोरगाव येथील पुजारी (गुरव) सीताराम दत्तात्रय धारक
(वय 83) यांनी ही माहिती दिली.
दसर्याला पहाटे पाच वाजता पाच तोफांचे पाच आवाज काढले जातात. पाच तोफा
सोनोरी येथील पानसे सरदाराने श्रीमयूरेश्वरास दिल्या आहेत. या तोफांचे
मानकरी वाघू अण्णा वाघ, भिकाजी गणेश वाघ, सदाशिव बाळकृष्ण वाघ आहेत. या
तोफांच्या दारुगोळ्याचे काम भारत सासवडे, हेरंभ सासवडे, स्वानंद सासवडे
(कासार) यांची मुले परंपरेनुसार पाहत आहेत. दारुगोळा भरणारी मंडळी
नाईक(जाधव, चव्हाण), जगताप, तावरे, सणस, पवार, माडकर आहेत.
मयूरेश्वराची पहिली पूजा धारक, गाडे परिवार करतात. श्रीमयूरेश्वराला पहाटे गरम पाण्याने अभ्यंगस्नान घातले जाते. सालकरी ढेरे यांची सकाळी 7 वाजता पूजा होऊन मंगलवाद्य वाजवून धुपारती केली जाते. मंदिरात येऊन सर्व गावकरी शोभेच्या दारूची आतषबाजी करतात. मंदिरात नऊ वाजता मंदिरासमोर पालखीचे नियोजन करण्यासाठी गावकर्यांची बैठक होते. दारुगोळ्याच्या आतषबाजीत नळे वापरले जातात. जे पोयटा मातीपासून बनवले जातात. हे नळे कुंभार मंडळी (रंगनाथ कुंभार) तयार करतात. बैठक झाल्यावर मानकर यांना शिधावाटप केले जाते. चौघडेवाले, नगारावाले, हिरा हिलालवाले, पंखेवाले, छत्रीवाले आणि राजदंड, चव्हाण मंडळी, भालदार, चोपदार, हालगीवाले हे शिधावाटपाचे मानकरी आहेत. वाटपाच्या वेळी विद्याधर वाघ हे सेवेकरींची नावे वाचतात.
दुपारी 3 वाजता श्रीमयूरेश्वरास पेशवेकालीन दागिने, पोषाखधारक व गाडे परिवार करतात. 4नंतर सर्वांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. रात्री 8.30 वाजता पालखी सीमोल्लंघनसाठी निघते. या वेळी श्रीमोरया समोर पाच तोफांचे आवाज काढले जातात. भक्तगण शोभेच्या दारूची आतषबाजी करतात. बाजारतळावर दुष्ट प्रवृत्तीची प्रतिकृती तयार केली जाते. तिचे रात्री 12 वाजता दहन केले जाते. त्यानंतर पालखीची पिंजारी काढली जाते. या वेळी देवास रेशमी गोफात बांधले जाते. चिंतामणी मोरया गोसावी यांची आरती केली जाते. पिंजारीचे मानकरी रायचंद पुंजाराम शहा यांचे वंशज शैलेश शहा यांच्याकडे पिंजारी दिली जाते. हरमाळीत हाणामारीचा खेळ खेळतात. नंतर पालखी फिरंगाईमातेकडे जाते.
गोंधळ्याने गोंधळ घातल्यावर पालखी बुद्धिमत्ता मंदिराकडे जाते. तुकाईच्या मंदिरात आल्यावर आरती करून पालखी गावात येते. येथील महादेव मंदिरात आरती होते. त्यानंतर श्रीमरीमाता, मारुती, भैरवनाथ, कालिकादेवी यांची आरती केली जाते. पालखी सिद्धार्थनगर, ब—ाह्मण आळी, कुंभारवाडा सोनबा मंदिराकडे जाते. त्यानंतर ग्रामस्थ पालखीसमोर आतषबाजी करतात.
सोनोबाच्या मंदिरात तीन जथांच्या पाटलाने आपटा पूजन करून पूजा ग्राम जोशी दिलीप वाघ करतात. या पूजेनंतर तीन जथाचे पाटील पालखीत ठेवतात. यानंतर वंशाळीचे वाचन शाहू महाराजांचे गादीचे वारसदार वाघ करतात. नंतर पहिला अंगारा – आपट्याचा प्रसाद शैलेश वाघ यांना दिला जातो. त्यानंतर संस्थान शितोळे, देशमुख, दिलीप माधवराव तावरे जथा थोरला जथा, गोपीनाथ तावरे, धाकटा जथा किसन जीवराम तावरे, थोरला जथा वाघ मंडळी मनोहर शिवराम वाघ, मधला जथा विघ्नहर भालचंद्र वाघ, धाकटा जथा मकरंद विनायक वाघ, गोसावी इनामदारमध्ये वामन गोसावी, नाममध्ये धुंडीराज सुधाकर गोसावी, नंतर काळे, इनामदार या सर्व मंडळींना अंगारा व आपट्याची मात्रा दिली जाते. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सीताराम दत्तात्रय धारक हे प्रसाद वाटतात.
पालखी धनगर वाड्याकडे आल्यानंतर तोफांचे आवाज काढले जातात. पालखी माळी, लोहाराळीतून, ग्रामपंचायतपासून चिंचेच्या बागेतून जाते. फेरीवाल्यांना ललकारी देऊन पिंजरी चढवली जाते. पुन्हा पालखी मुख्य पेठेतून मंदिरात येते. या वेळी गोसावी मंडळींची आरती असते. त्यांना ललकारी देण्याचे काम अंकुश लंबोदर, धारक करतात. मंडळी पंचारती ओवाळून आरती करतात. मोरगावचा श्रीमयूरेश्वराचा राजेशाही मर्दानी सोहळा ऐतिहासिक व राजेशाही असल्याची माहिती सीताराम दत्तात्रय धारक पुजारी(गुरव) यांनी दिली.
No comments:
Post a Comment