शिखर-शिंगणापुर के शंभू महादेव/ Shikhar-Shinganapur ke Shambhu Mahadev
| शंभू महादेव के मंदिर का सामान्य दृश्य |
| शंभू महादेव मंदिर पर अंकित शिल्प |
| हिरण के शिकार का दृश्य |
| बली मंदिर, शिखर-शिंगनापुर |

Posted: 30 Nov 2013 at 6:19pm
वाचे नाव :- शिंगणापूर जिल्हा :- सातारा जवळचे मोठे गाव :- दहीवडी, गोंदवले, फलटण, अकलूज. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात शिखर शिंगणापूर येथे प्राचिन स्वयंभू शिवमंदिर आहे. माण तालुक्यातून जाणार्या डोंगररांगेला महादेव डोंगररांग म्हणतात. या डोंगररांगेत वारूगड, वर्धनगड, महिमानगड, कल्याणगड हे किल्ले आहेत. याच रांगेच्या एका फाट्यावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर शिखरशिंगणापूरचे प्राचिन मंदिर आहे. पुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला. आजही दरवर्षी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुध्द अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. इतिहासात डोकावल्यास देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजाने हे गाव वसविले होते. त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे. शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी गावात मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतिर्थ असे म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते. इ.स.१७३५ मध्ये शाहू महाराजांनी देऊळाचा जिर्णोध्दार केला. त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्या आहेत. इ.स. १९७८ मध्ये शिखर शिंगणापूर मंदिराचा पुन्हा एकदा जिर्णोध्दार करण्यात आला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्य तज्ञाकडून ६० फूटी शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे. शिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला नगारखाना आहे. काळ्या पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे. खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. मंदिराच्या गाभार्या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे. मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग आहेत. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे. जाण्यासाठी :- सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये, सातारा - पंढरपूर रस्त्यावर, सातार्या पासून ६४ कि.मी. अंतरावर दहिवडी गाव आहे. दहिवडी गावापासून २२ कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर आहे. पुण्याहून फलटण गाठावे. फलटण - दहीवडी रस्त्यावर मोरोची येथे शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी फाटा आहे. फलटण - शिखर शिंगणापूर अंतर ६४ कि.मी. आहे. आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) वारूगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले शिखर शिंगणापूर मंदिरा बरोबर एका दिवसात पाहाता येतात. २) गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ. ३) फलटण येथील महादेवाचे मंदिर, राम मंदिर, राजवाडा. ४) अकलूजचा किल्ला ४५ किमी. Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra Shikhar Shinganapur Shiv Mandir , Village :- Shikhar Shinganapur , Dist :- Satara, Nearest city :- Dahiwadi, Gondawale, Phaltan, Akluj. Shikhar Shingnapur information marathi शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील एक गाव आणि धार्मिक स्थान आहे. येथे, सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर ऐतिहासिक काळापासून हे शंभू महादेवाचे मंदिर अस्तित्वात आहे. स्थान – (shikhar shingnapur mahadev)सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur) वसले आहे. फलटणपासून अग्नेयीस सुमारे ३७ किमी. एवढे अंतर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर (Shikhar Shingnapur) गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. शिखर शिंगणापूर मंदिराचा रोजचा दिनक्रमस. ६.०० : काकड आरती करून देवाला उठवले जाते. दु.१२.०० : देवाची आरती रा.८.०० : सांज आरती करून मंदिर बंद केले जाते. रा. ९.०० : शेजारती देवस्थानाचे वर्षभराचे कार्यक्रम: ऐतिहासिक महत्त्व – (Shikhar Shingnapur history)शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)चा शंभू महादेव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर (Shikhar Shingnapur) गाव दोनीही यादव कुळातील सिंधण राजाने वसवली आहेत, असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर (Shikhar Shingnapur) गाव वसविले. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इ.स. १६०० साली एक मोठे तळे येथे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे. आध्यात्मिक महत्त्वशिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)ची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासुन ते चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शु. अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाहाचा मुख्य सोहळ्यांपैकी असतो. तत्पुर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून (हळकुंड ) हळद जात्यावर दळली जाते. चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वर्हाडी म्हणून येतात आणि शंभु महादेवाला व पर्वतीमातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभु महादेव मंदिराचे शिखर(कळस) बांधून ते श्री अमृतेश्वर (बळी ) मंदिराचे शिखर(कळस ) यांना पागोटे (सुताची जाड दोरी) बांधले जाते. यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात. लग्नासाठी ५५० फूट लांब पागोटे विणले जाते. यांस शंभु महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. आणि रात्री १२ वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभु महादेव आणि पार्वतीमातेचा विवाह सोहळा “हर हर हर महादेव” च्या जयघोषात पार पाडला जातो. चैत्र शुद्ध एकादशीस इंदोरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत. मुंगी घाट सोहळाचैत्र शुद्ध द्वादशीस, मुंगी घाटातून कावड आणताना चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
परिसरपूर्वीच्या पायऱ्यांच्या रस्त्यावरून मंदिराकडे येताना एक भरभक्कम वेष लागते. हि वेष शिवाजी महाराजांनी मंदिर जीर्णोधाराच्या वेळी बांधली असून तिला जिजाऊ वेष असेही म्हणतात. वेशीतून आत येताना एक अतिशय सुंदर आणि तेवढाच भक्कम दरवाजा लागतो. त्याला शेंडगे दरवाजा म्हणतात. शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)चे दर्शन घेताना त्याच्या सभोवतालच्या निसर्गाची व तेथील अनमोल इतिहासाची जाणीव होते.
शेंडगे दरवाजा ओलांडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत पोहचतो. तेथेच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते. डाव्या हाताला नगर खाना आहे आणि समोरच पंच नंदीचे दर्शन आपल्याला घडते. पूर्वी येथे एकच नंदी होता नंतर कोणा एका भक्ताने आपला नवस फेडण्यासाठी चार नंदी अर्पण केले. नंदीच्या दर्शनानंतर आपण मुख्य मंदिराकडे निघतो. मंदिराच्या पायरी वर आपल्याला नतमस्तक पार्वती दिसते. लोटांगण घातलेली पार्वतीचे शिल्प चांदी मध्ये कोरलेले असून अतिशय देखणे आहे, शंकराला शरण गेलेली पार्वती यात दिसते. त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो.
शिंगणापूर (Shikhar Shingnapur)च्या डोंगरावरून एक तलाव दिसतो त्याचे नाव पुष्कराज तलाव असून तो मालोजी राजे यांनी बांधला आहे. शिंगणापूर (Shikhar Shingnapur) देवस्थान हे भोसले राजघराण्याचे खाजगी संस्थानाच्या ताब्यात असून महादेवाच्या सेवेचा मान पाच वेगवेगळ्या जमातींना दिलेला आहे.
ब्राह्मण हा मुख्य पुजारी असून देवाच्या नित्य पूजेचे काम ते पाहतात. गुरावांना नंदीच्या पूजेचा मान दिला आहे. कोळी समाजाचे लोक देवाच्या अंगाराची व्यवस्था पाहतात. जंगम लोक देवाच्या नैवेद्याची तयारी करतात. पाकशाळा महादेवाच्या मंदिराखाली असून जंगम तेथेच राहतात. गाड्शी जमातीतील लोक नगार खाण्याची व्यवस्था पाहतात. सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचे मंदिर. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या पवित्र पाद्स्पर्शाने पावन झालेले हे तीर्थ क्षेत्र आहे. नंदीच्या समोर एक भला मोठा अष्टकोन कोरलेला आपणाला दिसतो. या अष्टकोनात शिवाजी महाराजांनी शंभू राजांचे शुद्धीकरण करून घेतले होते. महादेवाच्या गाभाऱ्यात दोन लिंग असून त्यापैकी एक शंकर व एक पार्वतीचे आहे. लिंगावर अनेक लेप लाऊन आता ते गुळगुळीत झाले आहे. शिंगणापुरचे हे लिंग स्वयंभू आहे असे म्हटले जाते.
मंदिरा बाहेरील नंदी दगडाचा असून त्यावर आता पत्रा बसविला आहे. नंदीचा मंडप शंभर कमळाच्या बनविला आहे. अनेक वेगवेगळ्या अख्यायिका येथे ऐकायला मिळतात. सोरटी सोमनाथ मंदिरातील गडगंज संपत्ती लुटण्यासाठी गजनीच्या मोहमदाने असंख्य वेळा या देवळाच्या व देवाचा विध्वंस केला. यापैकी एका आक्रमणाच्या वेळी तेथील सोमनाथाचे लिंग सौराष्ट्रातून महाराष्ट्रात आणून ते शिंगणापूर (Shikhar Shingnapur) येथे स्थापले गेले अशी अख्यायिका आहे. आजही महाराष्ट्राशिवाय कर्नाटकातून अनेक भक्तजन शिंगणापूर (Shikhar Shingnapur) यात्रेला येतात. ते लोक या महादेवाला आपले कुलदैवत मानतात.
लिंगाचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारतांना महादेवाच्या मंदिरा मागे अनेक लहान देवळे दिसतात. एका देवळात प्रचंड मोठो घंटा दिसते. हि घंटा पंच धातूची असून पोर्तुगीज चर्च मधून आणली असावी असा अंदाज आहे. या घंटा वर रोमन अक्षरात सतराशे वीस असे लिहिले आहे.
मंदिरा बाहेर दोन दीपमाळ आहेत ज्या शिवाजी महाराजांनी बांधल्या आहेत. यातील एक दीपमाळ महाराजांनी आपल्या सेविकेच्या नावाने बांधली असून त्यांचे नाव “विरू बाई” होते. प्रत्येक मंदिरात गणपतीला स्थान असते. तसेच येथेही गाभाऱ्या बाहेर गणपतीची प्रतीष्टापणा केली आहे. या गणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट महणजे येथे दोन फिरते दगडी खांब आहे. पुरातन शिल्पा कलेचा अनोखा नमुना येथे पाहायला मिळतो. मंडपाच्या एका भिंतीवर कलींया मर्दनाचे सुंदर शिल्प कोरलेले दिसते.
मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार असून तीन उप प्रवेशद्वार आहेत. दक्षिणे कडील प्रवेशद्वारातून बाली मंदिराचे दर्शन घडते तर पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून शिवाजी महाराजांचं स्मृती स्थळ पाहायला मिळते. मंदिराच्या दक्षिण दिशेल सुमारे शंभर यार्डावर दुसऱ्या टेकडी वर दगडी बांधकाम आढळून येते. येथे तीन स्मारके आहेत. एका ओळीत असणारी हि स्मारके दक्षिणेकडे तोंड करून आणि पूर्व पश्चिम विस्तारलेली आहेत. पश्चिमे कडील स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून, मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील संभाजी महाराजांचे आहे. ऑगस्ट सोळाशे एकोण्याशी मध्ये संभाजी महाराजाची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर गादीवर आलेल्या शाहू महाराजांनी या स्मारकाची बांधणी केली. मंदिर दोन भागात विभागले गेले आहे. मूळ गाभारा आणि बाहेरचा सभा मंडप. सभा मंडपाचा आकार चांदणी प्रमाणे आहे. मंडपाला भिंतीचा आधार नसून तो बारा भक्कम खांबांवर बांधला गेला आहे. सध्या अनेक लहान खांब आधारासाठी बांधले आहेत. संपूर्ण मंदिराच्या खांबांवर पुराणातील अनेक कथा शिल्प रुपात कोरलेल्या आहेत. एका शिल्पात स्त्री शिकार करताना दर्शवली आहे. तसेच कुत्र्यांचा वापर शिकारी साठी दाखवला आहे. एका शिल्पात पुरुषाने बंदूक वापरताना कोरलेला आहे काही खांब हे फुल-वेलीच्या नक्षीत कोरलेले आहेत.
शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur) देवस्थान शिंगणापूर (Shikhar
Shingnapur)च्या डोंगरावर वसलेले आहे आणि येथील मंदिर अतिशय पुरातन असून
मोठ्या मोठ्या दगडी शिळांमध्ये घडवलेले आहे. मंदिराचा एकूण परिसर अंदाजे एक
एकर असावा. यादव कालीन हे मंदिर हेमाडपंती बांधकामाची साक्ष देते. शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोधार करताना मूळ मंदिराच्या सौंदर्यात कमीपणा येणार नाही याची काळजी घेतली. हे मंदिर इ. स. पू. बाराशे शतकातील असूनही आज भक्कम आहे. शंभू महादेवाच्या मंदिराजवळ डोंगराच्या खाली अमृतेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर बाली महादेवाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हेही मंदिर जुन्या दगडी बांधकामाची साक्ष देते. बाली महादेवाच्या मंदिरात आपल्याला शंकराच्या पिंडीत गायीचे खुर उमटलेले दिसतात. शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur) च्या डोंगरावर शिव पार्वतीचे लग्न विष्णू ने लावून दिले . शिव आणि हरी हे वेगळे नसून एकाच आहे आणि भक्तांनी भेद विसरून जावे हा संदेश येथे देण्यात आला आहे. याच संदेशाचे रूपक असणारे शिल्प शिंगणापूर (Shikhar Shingnapur)च्या मंदिराच्या खांबा वर दिसते. त्यात एक हत्ती आणि नंदी आहे. हत्तीचे शरीर झाकले तर नंदी दिसतो जो शंकराचे वाहन आहे आणि नंदीचे शरीर झाकले तर हत्ती दिसतो जो विष्णूचे वाहन आहे.
शिखर शिंगणापूर यात्राशिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)ची यात्रा बारा दिवस चालते. यात्रेची सुरवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेलाहोते. शुभशकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)च्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राज घराण्यातील युवराज किव्हा राजा शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)ला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात कि देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही. राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)ला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेऊन देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली, राजाचा राग शांत केला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते. शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)ची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी हि पहिलीच यात्रा असावी. श्री शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)च्या यात्रेतील सर्वात अदभूत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थ क्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावडभुतोजी तेली यांची असते. भुतोजी तेली यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रे अगोदर हि मानाची कावड सासवड वरून प्रस्थान करते. फार पूर्वीपासून हि प्रथा चालू आहे. देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेऊ नये ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्तीत होणार नाही. या विचारापोटी भुतोजी तेली शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)च्या यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या घरादारास आग लावीत असत. निसंकोच मनाने आणि देवाच्या ओढीने त्यांची कावड द्वादशीलाशिंगणापूर (Shikhar Shingnapur)च्या पायथ्याशी पोहचत असे. दुपार नंतर हि कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे द्रुश्य फारच मोहक असते. सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे पण आजही शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)ला येणाऱ्या कावडी धोंड्याच्या मुंगी घाटातूनच वर मार्ग काढतात. मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. पूर्वी जेव्हा भुतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपवून घरी जात त्यावेळी त्यांचे घर व दार सर्व सुखरूप असे. श्री शंभू महादेवाची लीला अपरंपार आहे. यातच श्री शंभू महादेवाच्या चमत्काराची प्रचीती येते. सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात. तुम्हीही या सोहळ्यात शामिल व्हा आणि देवाचा हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पहा मगच तुम्हाला श्री शंभू महादेवाच्या अस्तित्वाची खरी प्रचीती येईल. कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. कावड सहा कवड्यांच्या खांद्यावरून नेली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur) वाट पूर्ण करतात. मौज म्हणून कवड्यामध्ये रस्सीखेच खेळली जाते. कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जन कावडीचे दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे. आजही भुतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)च्या यात्रेस येतात. येताना प्रतीकात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)च्या दिशेने चालू लागते. द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूर (Shikhar Shingnapur)ची यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरु होतो. सार्वजन भक्तीत न्हाऊन आपापल्या घरी जातात. https://www.santsahitya.in/tirthkshetra/shikhar-shingnapur/ ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेलं एक रम्य ठिकाण शिखर शिंगणापूर!Balkrishna Madhale
सातारा : शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शाेधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला 'दक्षिण कैलास' असे म्हणतात. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून 20 किलाे.मीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे, असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. डोंगराच्या कुशीतील यवतेश्वर; यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही आहे. दरम्यान, श्रावणात या तीर्थस्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. https://www.esakal.com/tourism/satara-article-about-shikharsinghnapur-lord-shiva-temple-331880 शिखर शिंगणापूर माहिती मराठी | Shikhar shinganapur information in Marathi - Marathi Speakshikhar shinganapur information in Marathi:शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील एक गाव आणि धार्मिक स्थान आहे.येथे सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर ऐतिहासिक काळापासून हे शंभू महादेवाचे मंदिर अस्तित्वात आहे.सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर हे गाव वसले आहे. या लेखात आपण शिखर शिंगणापूर माहिती मराठी (Shikhar shinganapur information in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ![]()
Contents [hide]
फलटण पासून आग्नेयस सुमारे 37 किलोमीटर एवढे अंतर आहे इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेव चा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर हे गाव आहे. हा डोंगर म्हणजेच सह्याद्रीचा एक फाटा असल्याचे डोंगरावर झाडे आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्रसपाटीपासून 1050 मीटर उंचीवर आहे. मंदिरात जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. नंदीच्या दर्शनानंतर आपण मुख्य मंदिराकडे निघावे मंदिराच्या पायरीवर आपल्याला नतमस्तक पार्वती दिसते.लोटांगण घातलेली पार्वतीची शिल्प चांदी मध्ये कोरलेले असून अतिशय देखणी आहे. शंकराला शरण गेली पार्वती यात दिसते यापुढे कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो. शिंगणापूरच्या डोंगरावरून एक तलाव दिसतो त्याची नाव पुष्कराज तलाव असून तो माळोजी राजे यांनी बांधला आहे.शिंगणापूर देवस्थान हे भोसले राज घराण्याचे खाजगी संस्थानाच्या ताब्यात असून महा दिव्याचा सेवेचा मान पाच वेगवेगळ्या जमातींना दिलेला आहे. ब्राह्मण हा मुख्य पुजारी असून देवाच्या नित्य पूजेचे काम ते पाहतात. गुरवाणा नंदीच्या पूजेचा मान दिला आहे. कोळी समाजाचे लोक देवाच्या अंगाराची व्यवस्था पाहतात. जंगम लोक देवाच्या नैवेद्याची तयारी करतात. पाकशाळा महादेवाच्या मंदिराखाली असून जंगम तेथेच राहतात.गाडशी जमातीतील लोक नगारा खाण्याची व्यवस्था पाहतात.सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचे मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली हे तीर्थक्षेत्र आहे. नंदीच्या समोर एक भला मोठा अष्टकोन कोरलेला आपणास दिसतो. या अष्टकोनामध्ये शिवाजी महाराजांनी शंभूराजांचे शुद्धीकरण करून घेतले होते.
महादेवाच्या गाभाऱ्यात दोन लिंग असून त्यापैकी एक शंकर व एक पार्वतीचे आहे.लिंगावर अनेक लेप लावून आता ते गुळगुळीत झाले आहेत. शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू आहे असे म्हटले जाते. मंदिराच्या बाहेरील नंदी दगडाचा असून त्यावर आता पत्रा बसवला आहे. नंदीचा मंडप 100 कमळाच्या बनविला आहे. अनेक वेगवेगळ्या अख्यायिका येथे ऐकायला मिळतात. सोमनाथ मंदिरातील गडगडचे संपत्ती लुटण्यासाठी गजनीच्या मोहमदाने असंख्य वेळा व देवळाच्या व देवाच्या विध्वंस केला.यापैकी एका आक्रमणाच्या वेळी तेथील सोमनाथांची लिंग स्वराष्ट्रातून महाराष्ट्रात आणून ती शिंगणापूर येथे स्थापन केले असे आख्यायिका आहे.आजही महाराष्ट्र शिवाय कर्नाटकातून अनेक भक्तजन शिंगनापूर यात्रेला येतात.ते लोक या महादेवाला आपले कुलदैवत मानतात. लिंगाचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारताना महादेवाच्या मंदिरामागे अनेक लहान देवळे दिसतात. एका देवळात प्रचंड मोठी घंटा दिसते ही घंटा पंचधातूची असून ती एका चर्चा मधून आणली असावी असा अंदाज आहे.
या घंटावर रोमन अक्षरात 1720 असे लिहिले आहे. मंदिरा बाहेर दोन दीपमाळ आहेत. ज्या शिवाजी महाराजांनी बांधले आहेत. त्यातील एक दीपमाळ महाराजांनी आपल्या सेविकेच्या नावाने बांधली असून त्यांचे नाव वीरूभाई असे होते.प्रत्येक मंदिरात गणपतीला स्थान असते तसेच येथेही गाभाऱ्याबाहेर गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. या गणपतीच्या मंदिराचे विशिष्ट म्हणजे येथे दोन सरते दगडी खांब आहेत.पुरानात शिल्पा कलेचा अनोखा नमुना येथे पाहायला मिळतो. मंडपाच्या एका भिंतीवर कलियमर्दनाचे सुंदर शिल्प कोरलेले दिसते. मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत.एक मुख्य प्रवेशद्वार असून तीन उपप्रवेशद्वार आहेत.दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून बाली मंदिराचे दर्शन घडते तर पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून शिवाजी महाराजांचे स्मृतीसह पाहायला मिळते.मंदिराच्या दक्षिण दिशेस सुमारे 100 यार्डंवर दुसरा टेकडीवर दगडी बांधकाम आढळून येते. शिखर शिंगणापूर माहिती मराठी (Shikhar shinganapur mahiti Marathi)येथे तीन स्मारके आहेत. एका ओळीत असणारी ही स्मारके दक्षिणेकडे तोंड करून आणि पूर्व पश्चिम विस्तारलेले आहेत. पश्चिमेकडे स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील संभाजी महाराजांची आहे. ऑगस्ट 1669 मध्ये संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली.त्यानंतर गादीवर आलेला शाहू महाराजांनी या स्मारकाची बांधणी केली.
मंदिर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे. मुळ गाभारा आणि बाहेरचा सभामंडप सभा मंडपाचा आकार चांदणी प्रमाणे आहे. मंडपाला भिंतीचा आधार नसून तो 12 भक्कम खांबावर बांधला गेला आहे. सध्या अनेक लहान काम आधारासाठी बांधले आहेत.संपूर्ण मंदिरांच्या खांबावर पुराणातील अनेक कथा शिल्प रुपात कोरले गेले आहेत. एका शिल्पात स्त्री शिकार करताना दर्शविले आहे तसेच कुत्र्याचा वापर शिकारीसाठी दाखवला आहे. एका शिल्पात पुरुषाने बंदूक वापरताना कोरलेला आहे.काही खांब हे फुल वेलीचे नक्षीत कोरलेले आहेत.शिखर शिंगणापूर देवस्थान शिंगणापूरच्या डोंगरावर बसलेले आहे आणि येथील मंदिर अतिशय पुरातन असून मोठ्या मोठ्या दगडी खेळांमध्ये घडवलेले आहे.मंदिराचा एकूण परिसर अंदाजे एक एकर असावा. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 150 चढाव्या लागतात. परंतु आता रस्त्याची सोय केल्याने गाड्या सरळ मंदिरापर्यंत जातात.हे मंदिर यादवकाळात बांधले गेलेले असून परिसराचे नाव शिंगणापूर हे यादव राजा शृंगारपूर यांच्या नावावरून देण्यात आले आहे. यादवकालीन हे मंदिर हेमाडपंथी बांधकामाची साक्ष देते.शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार करताना मूळ मंदिराच्या सौंदर्यात कमीपणा येणार नाही याची काळजी घेतली आहे.हे मंदिर इसवी सन पूर्व 1200 शतकातील असून आजही भक्कम आहे. शिखर शिंगणापूर माहिती मराठी (shikhar shinganapur information in Marathi)
शंभू महादेवांच्या मंदिराजवळ डोंगराच्या खाली अमृतेश्वरांची मंदिर आहे. हे मंदिर बाली महादेवाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हेही मंदिर जुन्या दगडी बांधकामाची साक्ष देते. बाली महादेवाच्या मंदिरात आपल्याला शंकराच्या पिंडीत गायीची खूर उमटलेले दिसतात. शिखर शिंगणापूरच्या डोंगरावर शिवपार्वतीचे लग्न विष्णू ने लावून दिले शिव आणि हरी हे वेगळे नसून एकच आहेत आणि भक्तांची भेद विसरून जावे हा संदेश येथे देण्यात आला आहे. या संदेशाची रूपक असणारे शिल्प शिंगणापूरच्या मंदिराच्या कामावर दिसते.त्यात एक हत्ती आणि एक नंदी आहे हत्तीचे शरीर झाले तर नंदी दिसतो जो शंकराचे वाहन आहे आणि नंदीचे शरीर झाकले तर हत्ती दिसतो जो विष्णू चव्हाण आहे. शिखर शिंगणापूर मंदिराची आरतीसकाळी 6 वाजता काकड आरती करून देवाला उठवले जाते.दुपारी 12 वाजता देवाची आरती आणि रात्री 8 वाजता सांज आरती अशी करून मंदिर बंद केले जाते. रात्री नऊ वाजता शेजारती प्रतीक आरती नंतर जंगमने केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.
देवस्थानाचे कार्यक्रममहाशिवरात्रीमहाशिवरात्री ही शंकरांच्या भक्तांसाठी मोठी परवणी आहे.महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहण्याचा मोठा कार्यक्रम असतो. महाशिवरात्रीचा महोत्सव पाच दिवस चालतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम असतो. दर अमावस्येला शिखर शिंगणापूरची वारी असते. अनेक भक्तजन अमावस्येला महादेवाचे दर्शन करून मग गुप्तलिंगाला भेट देऊन आपापल्या घरी जातात.आषाढी वारीला नियमित जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे भक्तगण महादेवाच्या वारीला येतात. यात्रा म्हणजे देवाचे लग्न हा वार्षिक उत्साह अतिशय नयनरम्य असा सोहळा असतो.याची अनुभूती याची देही याची डोळा पहावी. शिखर शिंगणापूरचा मुंगी घाट सोहळाचैत्र शुद्ध द्वादशी मुंगी घाटातून कावड आणताना चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भूत्या तेलाची या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात व ते वर घेऊन जाणे हे तशी कष्टाचे काम आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायले त्यालाच मदतीला बोलवतात.मग ही कावड वर नेले जाते आणि महादेवाला अभिषेक होतो. पूर्वीच्या पायऱ्यांच्या रस्त्यावरून मंदिराकडे येताना एक भर भक्कम वेश लागते ही वेश शिवाजी महाराजांनी बांधली असून तिला जिजाऊ वेश असेही म्हणतात. वेशीतून आत येताना एक अतिशय सुंदर आणि तेवढेच भक्कम दरवाजा लागतो त्याला शेडगे दरवाजे म्हणतात. शिखर शिंगणापूरचे दर्शन घेताना त्याच्या सभोवताच्या निसर्गाची व तेथील अनमोल इतिहासाची जाणीव होते. शेडगे दरवाजा ओलांडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो तेथेच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते.
डाव्या हाताला नगर खाना आहे आणि समोरच पंचनदीचे दर्शन आपल्याला घडते. पूर्वी तेथे एकच नंदी होता नंतर कोना एका भक्ताने आपले नवस फेडण्यासाठी चार नंदी अर्पण केले. शिखर शिंगणापूरचे ऐतिहासिक महत्त्वशिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांचा कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर व शिंगणापूर हे गाव दोन्हीही यादव कुळातील सिंधन राजाने वसवली आहेत असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारामध्ये पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंधन राजा येथे येऊन राहिले होते. त्यांनीच शिंगणापूर गाव वसविले. शंभू महादेव हे भोसले घराण्याची कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी येथे इसवी सन 1600 साली येथे एक मोठे तळे येथे बांधले त्यास पुष्कर तीर्थ असे म्हणत. त्यालाच आता शिवतीर्थ असे म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे 1735 मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.
1978 मध्ये त्यांचाही जिनत्वावर झाला. दक्षिणेतील राम स्वामी नावाच्या एका स्थापत्य तज्ञांकडून शिखराची व मंदिराची दगजुटी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाह चा मुख्य सोहळ्यांपैकी असतो. तत्पूर्वी चैत्रशुद्ध प्रतिपदेचे विवाहाचा मुहूर्त म्हणून हळकुंड हळद जात्यावर दळली जाते. चैत्रशुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराची शिखर कळस बांधून ते श्री अमृतेश्वर बळी मंदिराची शिखर कळस यांना पागोटे सुताची जाड दोरी बांधली जाते.यासाठी लागणारी पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात लग्नासाठी 550 फूट पागोटे विणले जाते. या शंभू महादेवांचा लग्नाचा आहेर मानला जातो. ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात आणि रात्री बारा वाजता मंगलाष्टके व सनई चौघडांच्या गजरात शंभू महादेव व पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेव च्या जयघोषात पार पाडला जातो.चैत्र शुद्ध एकादशीस इंदौर चे राजे कूळसर महादेवांचे दर्शन घेत.
शिखर शिंगणापूर यात्राशिखर शिंगणापूरची यात्रा बारा दिवस चालते यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. शुभ शकुनांची गुढी उभारून श्री क्षेत्र शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो.पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री बारा वाजता देवाची लग्न लावली जातात. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शंकर शिंगणापूर ला येतो आणि देवस्थानातर्फे राजांचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात की देवांना लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही राजा रागवून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशी दिवशीचा उपवास असूनही देवावर रागावला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेवून देवाच्या लग्नाला आला. महादेवाने राजाची समजूत काढली राजाचा राग शांत झाला आणि राजाचा सत्कार केला.आजही हीच परंपरा राखली जाते. शिखर शिंगणापूर ची यात्रा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात.अशा प्रकारे झाडे नेमून देणारी ही पहिलीच यात्रा असावी. शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अद्भुत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थक्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते.
बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मानाची कावड भूतोजी तेली याची असते. यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रेअगोदर ही मानाची कावड सासवड प्रस्थान करते.फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे. देवाला जाताना नी संकोच मनाने जावे आणि मागे काही ठेवू नये. ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्थित होणार नाही. दुपारपर्यंत त्यांची कावड ही देवाच्या पायथ्यापर्यंत पोहोचत असत दुपारनंतरही कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे दृश्य फारस मोहक असते.सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे. पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी घोड्यांच्या मुंगी घाटातून वर मार्ग काढतात मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात.कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावड चढवत असताना हलगी आणि लेझीम यांच्या तालावर अनेक भक्तजन आपापल्या नाचायला पाहायला मिळतात. कावड ही सहा खांद्यांवरून आणली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. कावड्यातील पाणी निरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जण कावडीचे दर्शन घेतात.लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे.
आजही भुतोजी तेली यांचे वंशज शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात.द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्री करूचा परतीचा प्रवास सुरू होतो. https://marathispeak.in/shikhar-shinganapur-information-in-marathi/ शिखर शिंगणापूर (शंभू महादेव म्हणजे महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत) शिखर
शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत. सातारा
सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर शंभू महादेवाच्या
डोंगररांगेतील शिखरावर हे मंदिर प्रचीन काळा पासून प्रसिध्द आहे.
देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येवून राहिला होता. त्यानेच
शिंगणापुर गांव वसविले. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत.
मालोजीराजे आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या
दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी एक मोठे तळे
येथे बांधले, त्यास पुष्करथिर्थ असे म्हणतात. पुर्वीचे देऊळ पडल्यामुळे
१७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचा
जिर्णोध्दार झाला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्यतज्ञाकडून शिखराची व
मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे. स्थान सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. बांधकाम या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. आध्यात्मिक महत्व मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो. ऐतिहासिक महत्व महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. प्रेक्षणीय स्थळे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. चित्रपट शंभू माझा नवसाचा हा या अध्यात्मिक स्थानावर चित्रीत चित्रपट आहे. अलका कुबल-आठल्ये,मिलिंद गुणाजी या प्रमुख कलाकारांच्या यात भुमिका आहेत. वेबसाईट - http://satarainfo.in/ सौजन्य - http://satarainfo.in/ See less शिखर शिंगणापूर | Discover MaharashtraDiscover Maharashtra
शिखर शिंगणापूर…छत्रपति शिवाजी महाराज , शंभूराजे आणि समस्त भोसले कुळाचे कुळदैवत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत माणदेशातील शिवक्षेत्र श्री शिखर शिंगणापूर मंदिर ! शिखर शिंगणापूरची स्थापना सिंघणराजे यादव (१२१० – ४७) या राजाने केली. म्हणून यास काळानुरूप शिंगणापूर हे नाव पडले आहे. इथल्या डोंगर माथ्यावर एखाद्या शिरपेचा प्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते . हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते तसेच शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील कुलदैवत आहे. साधारणतः २ एकर परिसरात वसलेल्या या सुंदर मंदिराजवळ पोचण्यास जवळपास शेकडो पायऱ्या चढून जावे लागते. पायरी मार्गाने येत असताना मध्ये एक जिजाऊ वेशीतून पुढे येऊन सुबक आणि भक्कम शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ पोहचता येते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपणास समोर नंदी आणि डाव्या बाजूस नगारखाना पहावयास मिळतो. नंदीच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना भगवान शंकरास शरण आलेल्या पार्वतीचे चांदीमध्ये कोरलेले शिल्प आणि त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरात प्रवेश घेऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन होते. मंदिराच्या गाभाऱ्यात एक भगवान शंकर आणि दुसरे पार्वती आशी दोन लिंग आहेत यांची आहेत. शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू लिंग मानले जाते. महादेवाच्या या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती पद्धतीचे आहे. या मंदिरास एक मुख्य आणि तीन उप-प्रवेशद्वार असे एकूण ४ प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या आवारात दोन दीपमळा पाहण्यास मिळतात. मंदिराचे एकूण शिल्पकाम हे अतिशय सुंदर आणि सुबक असून यातून प्राचीन काळातील उत्तम सुबक शिल्पकलेचा अनुभव घेता येतो. इ. स. पूर्व बाराशे शतकातील या मंदिराचे सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला. मंदिराचे छत हे एकूण १८ दगडी खांबावरती स्थित आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर पर्यंत विस्तारित आहे आणि त्यावर मंदिराचे शिखर स्थितः आहे शिखराच्या समोर सभामंडपाच्या वरती दोन्ही बाजूस हत्तीचे शिल्प पहावयास मिळते.मंडपामध्ये ३ तांब्या पितळे सजवलेले नंदी आहेत. मंदिराच्या शिखरावर आणि खांबांवर अनेक देवी देवतांची कोरलेली शिल्पे तसेच अनेक प्रसंग पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत तसेच इथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पहावयास मिळते. बळी महादेवमंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास “बळी महादेव” म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे. मंदिराचे प्रेवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे. मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे. रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो. मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे. मुख्य (महादेवाच्या) मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्यातून थोड्या अंतरावर एका टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या स्मृती स्मारकांचे दर्शन होते. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र शाहू महाराज यांनी या स्मारकाचे बांधकाम केले. यामध्ये अनुक्रमे पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज, मध्ये शहाजी महाराज आणि पूर्वेला संभाजी महाराज अशी स्थित आहेत. मंदिराच्या आवारातून दूरवर एक तलाव दिसतो त्यास पुष्कराज तलाव महणून ओळखले जाते याचे बांधकाम अथवा जीर्णोद्धार शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांनी कलेले आहे. यात्रा : १२ दिवस चालणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडी पाढव्याला होते. पंचमीला पार्वती शंकराला हळद लागते व अष्टमीला रात्री १२ वाजता देवाची लग्न लागते. हि यात्रा महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबनात भरते. कावड हे या यात्रेचा महत्वपूर्ण भाग मानला जातो. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध ठिकाणाहून पाणी घेऊन कावडी येतात. या पैकी मनाची कावड ही सासवड इथल्या “भुतोजी तेली” ( तेल्या भूत्याची कावड म्हणून प्रसिद्ध आहे ) यांची असते. द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला पोचून दुपारी ही कावड आतिशय अवघड मुंगी घाटातून डोंगरावर चढवली जाते. हा सोहळा हा अतिशय वोलोभनीय आणि रोमांचक आसतो यामध्ये वाद्यांच्या तालावर भक्तमंडळी तल्लीन होऊन नाचतात तसेच खांद्यावरून नेल्या जाणऱ्या कावडींची नयनरम्य अशी रस्सिखाच देखील खेळली जाते. द्वादशीच्या मध्यरात्री कावडीच्या पाण्याने देवांस अभिषेक घातला जातो. गुप्तलिंग :शिखर शिंगणापूर पासून जवळच असलेले हे देवस्थान. भगवान शंकर तपश्चर्येला बसले असता माता पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेऊन तपश्चर्या भंग केली तेव्हा महादेव क्रोधीत होऊन त्यांनी आपली जटा दगडावर आपटली आणि तिथून पाण्याचा प्रवाह प्रकट झाला हा गोमुखातून पडणारा प्रवाह आजही पाहण्यासा मिळतो. पार्वतीने माफी मागून शंकरास शांती केले आणि पुढे चैत्र शुद्ध अष्टमी शिखर शिंगणापूर येथे त्यांचा विवाह झाला. या मंदिराजवळ पायऱ्या उतरून जावे लागते. या ठिकाणाचे दर्शन केल्या नंतरच शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते. क्रेडीट – Unknown Gate of shikhar shingnapur महादेव temple 319 views View 8 upvotes Anonymous याच रांगेच्या एका फाट्यावर समुद्र सपाटी
पासून १,०५० मी. उंचीवर
शिखरशिंगणापूरचे प्राचिन मंदिर आहे.
शिखर शिंगणापूर
पुराणातल्या
कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला
बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी
आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून
पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून
पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा
मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र
शिखर शिंगणापूर येथे पार पडला. आजही दरवर्षी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुध्द अष्टमीला शंकर पार्वती
विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला
हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट
लांब पागोटे विणले जाते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक
टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
इतिहासात डोकावल्यास देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण
राजाने हे गाव वसविले होते. त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर
पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव
प्रचलित झाले असावे. शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी
येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी
पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला
येणार्या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी गावात
मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतिर्थ असे म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो.
शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर
शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४०
फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही
दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.
इ.स.१७३५ मध्ये शाहू महाराजांनी देऊळाचा जिर्णोध्दार
केला. त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा
प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या
मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी
शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी
महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे)
बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व
दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात
बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या
व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन
आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्या आहेत.
इ.स. १९७८ मध्ये शिखर
शिंगणापूर मंदिराचा पुन्हा एकदा जिर्णोध्दार करण्यात आला. दक्षिणेतील
रामस्वामी स्थापत्य तज्ञाकडून ६० फूटी शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग
देण्यात आला आहे.
शिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला नगारखाना आहे.
काळ्या पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे
आहे. मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे.
खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व
पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका
शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं
असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने
झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्या बाजूने झाकल्यास हत्ती
दिसतो. मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे.
दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे.
मंदिराच्या गाभार्या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे.
गाभार्याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग
आहेत. गाभार्याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे.
त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या -
पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज
बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा
उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत.
त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे.
मंदिराच्या
पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने अमृतेश्वर मंदिराकडे जाता
येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग आहेत.
मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे.
शिंगणापूरचे मंदिर पाहून https://samantfort.blogspot.com/2018/10/
aaplibaramatinews.com
आपली परंपरा, आपला अभिमान; शिखर शिंगणापूरची यात्रा आणि कावड…!आपली बारामती न्यूज
![]()
शंभू महादेव आपल्या पत्नी पार्वती वर रुसून बसलेले असतात, पार्वती देवी ज्या डोंगराच्या ठिकाणी त्यांना शोधून काढतात आणि दुसऱ्यांदा लग्न करतात ते ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर असं जेष्ठ लोकांच्या गोष्टींमधून सांगितले जातं. शिंगणापूर ला दक्षिण कैलास असेही म्हणतात. शहाजीराजे, मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचेही श्रद्धास्थान म्हणून शिंगणापूर ओळखले जाते. आज छत्रपती भोसले घराण्याचे हे खाजगी देवस्थान आहे. कावड म्हणजे उभी पताका, त्यावरती बांधलेले डौलात हलणारे वनगायीचे केस, खांदा देण्यासाठी मागे आणि पुढे खांदे, खांद्याच्या मधील जोडणीला बसवलेले पाण्याने भरलेलं दोन तांब्याचे, पितळेचे कलश (रांजण) , नंदीची लहानशी मूर्ती आणि उभा करण्यासाठी चार समांतर पाय. तर काठ्या म्हणजे फक्त मोठी काठी आणि बांधलेली पताका ती एक माणूस डोक्यावर उचलून घेऊ शकतो. तर कावडींच्या आकारानुसार खांद्याला दोन किंवा चार लोकं लागतात दोराला दोघे चौघे सोबतच असतात. वेगवेगळ्या गावांच्या कावडीचा आकार आणि त्यांची बांधणी वेगवेगळी असते. तरुणांचा सहभाग या पायी वारी मध्ये लक्षणीय असतो, चालत असताना पुढचे टप्पे आणि खांदेकरी ठरलेले असतात, ठरलेल्या वेळेपर्यंत पुढच्या गावात कावड खांद्यावर घेऊन पोहचवली जाते. वाटेतील गावांमध्ये या चालणाऱ्यांसाठी गावकरी स्वइच्छेने अन्नदान करतात. शेतामध्ये असणाऱ्या काकड्या, कलिंगडे, खरबूज, लिंबूसरबत ही वाटप करत असतात. निंबळक च्या कॅनॉल वर तासभर पोरं पोहतात आणि तिथून मग बरड वरून पुढे जात विसाव्याची (ठिकाणचे नावच विसावा आहे) वाट पाहत डोळे आतुरलेले असतात. बरड ते विसावा अंतर लवकर तुटत नाही तिथं तुमच्या शारीरिक क्षमतांचा कस लागतो, उन्हाची तीव्रता कमी झालेली असते पण चालून चालून शरीर थकलेले असतं. विसाव्यावर आल्यानंतर कावडीची आरती होते. एकावर एक पाच सात छोटी चपटी दगडी मांडून लोक विसाव्याची खूण मांडतात. त्यानंतर कावड मुक्कामाच्या ठिकाणी पोहचते. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आंघोळ नाश्ता करून कावडी कोथाळे गावात महादेव मंदिरापाशी येतात आणि तिथं कावडी हलगी आणि डफड्याच्या तालावर नाचवल्या जातात, तरूण मोठ्या उत्साहाने त्या लयबद्ध तालावर नाचत असतात, वेगवेगळ्या गावांच्या कावड्यांची आणि वादकांची जणू नाचण्याची स्पर्धाच तिथं होत असते. कोथळे गावात गुलालाची उधळण करून कावड मुंगी घाटाच्या पायथ्याला येऊन विसावते. मुंगी घाट म्हणजे खालून पहिलं तर वर जाणारी माणसं ही मुंगी सारखी लहान आणि रांगांनी चाललेली दिसतात म्हणून त्याला मुंगी घाट बोलतात असं जेष्ठ लोकांकडून सांगितलं जातं. घाट चढायच्या आधी थोडावेळ सगळे विसावा घेतात. तोंडाला कोरड पडू नये म्हणून आपल्या कावडी सोबतच्या लोकांना तोंडात ठेवायला लिंबू आणि लेमन गोळ्या दिल्या जातात. कावडीला पुढं अधिकचा मोठा दोर बांधला जातो आणि हर हर महादेव… म्हणत कावड घाट चढायला चालू करते. जवळपास अश्याच शेकडो कावडी एकाच वेळी घाट चढत असतात. व्यवस्थापन करणारे जेष्ठ घाट चढताना कावडीला खांदेकरी हे काटक, चपळ आणि अनुभवी लोकांना ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, दोरीलाही अनुभवी आणि काही नवखे तरुण असा मेळ घातला जातो. “हर हर महादेव… हरहर बोला…” च्या वातावरणात संपूर्ण घाट शिवमय झालेला असतो. “म्हाद्या धाव, म्हाद्या धाव… लोकांना सांभाळ” असंही एकेरी धावा काही जेष्ठ महादेवाच्या प्रेमापोटी करत असतात त्यात त्या भक्ताच्या आणि महादेवाच्या निर्मळ नात्याचा प्रत्यय येत असतो. शेवटच्या टप्प्यावर सरळ पंधरा ते वीस फुटाचा अखंड खडक आहे तिथं खांदेकरी आणि दोरीच्या माणसांची खरी परीक्षा असते. पुढे दोरीला तरुणांकडून खेचलं जात असतं आणि पुढच्या खांदेकऱ्याला ९० डिग्रीत खडकाला पाय देऊन चढावं लागतं त्यामुळे त्याच्या खांदा आणि पाय दोन्हीवर एकाच वेळी ताण येतो, मागच्या खांदेकऱ्याला कावडीला घट्ट धरून चपळाईने वरती यावं लागतं तर कावडीच्या पायांना धरून वर जाण्यासाठी मागच्या लोकांची तिघांची घाई चाललेली असते. हरररर बोला… म्हणत तो टप्पा पूर्ण होतो. तेलोजी भुते ही मानाची कावड तर कोणत्याही दोराचा आधार न घेता मानवी हातांच्या साखळीने सगळ्यात शेवटी चढवली जाते. कावड घाट चढून वरती येते आणि तयारीत असणारे डफडे वाले आणि हलगी वाले वाजवायला सुरू करतात तिथं विजयाचा आनंद, महादेवाच्या भेटीची उत्सुकता नाचून साजरी केली जाते. तिथून पळतच कावड वरील देवळांना भेटी देत मुख्य महादेव मंदिरा समोर आणून पुन्हा नाचवली जाते. पाण्याचे कलश (रांजण) सोडून मंदिरामध्ये नेले जातात. आणि त्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घातला जातो, पावसासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. दोनचार दिवस चालून आलेला शीण महादेवाच्या भेटीने नाहीसा होतो. तिथून कावडी कावडी तळाकडे प्रस्थान करतात. एक दिवस मुक्काम करून चालतच रेडे घाटाने परतीच्या वाटेला चालू लागतात. तर काही आपापल्या सोयीने ट्रॅक्टर मधून मानकऱ्यांच्या घरी, गावात येवून विराजमान होतात. असा हा शंभू महादेवाच्या कावडीचा सोहळा अनेक आठवणी, अनुभवांसह संपन्न होतो. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असा हा पायी वारीचा सोहळा असतो जिथं जातपात, धर्म, गरीब, श्रीमंत अशी कोणतीही भिंत न पळता ‘ शंभू महादेवाचा भक्त’ या एका शब्दाखाली माणसं माणूस म्हणून एकत्र येतात. महादेव सर्वांचं भलं करो! सुरज महेंद्र पिसाळ, पणदरे, ता. बारामती |
















No comments:
Post a Comment