राजवंह्स्ग्शाच्या आणि वाकाटकांच्या शिलालेखात मंदीर बांधणीचे उल्लेख मिळतात. एका शिलालेखात प्रवरसेनच्या नावाने बांधलेले मंदीर अश्या अर्थाने "प्रवरेश्वरषडविंशति" असा उल्लेख आला आहे. "मोंडस्वामिन" आणि "रामगिरीस्वामीन" हे उल्लेख स्थाननामावरुन देवाच्या मुर्तीची केलेली स्थापना स्पष्टपणे सुचित करतात.रामटेक येथील केवलनरसिंह मंदीरातील पंधरा ओळीच्या प्रभावतीगुप्ताप्रशस्ती मध्ये त्याच मंदीराचा उल्लेख प्रभावतीस्वामीन असा केलेला आढळतो. पवनार येथे सध्याच्या विनोबाजींच्या आश्रमाजवळ काही वास्तु अवशेष ( उदा. कमळाची नक्षी असलेला छताचा भाग ) सापडलेले शिल्पपटाचे अवशेष तेथे विष्णुचे मंदीर असल्याचा स्पष्ट पुरावा देतात. हे मंदीर बहुधा वाकाटककालीन असावे.
महाराष्ट्राची प्राचीन ‘सम्राज्ञी’ : प्रभावती गुप्त
‘वाकाटक’ म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक इतिहासात क्रांती घडवणारे प्राचीन राजघराणे. या राजघराण्याच्या दोन शाखा. एक ‘नंदिवर्धन‘ (नगरधन, नागपूर) आणि दुसरी शाखा ‘वत्सगुल्म‘ (वाशीम). पूर्व विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या भागावर याच नंदिवर्धन शाखेने राज्य केले. ही शाखा तशी फार प्रबळ. सुस्थितीत उभे असणारे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर बांधणारे हे घराणे.
या शाखेच्या ‘रुद्रसेन’ नावाच्या राजाबरोबर ‘प्रभावतीगुप्ता‘ चे लग्न झाले. भारताला सुवर्णयुग दाखवणारे राजघराणे म्हणजे गुप्त. प्रभावती याच घराण्यातील पराक्रमी राजा समुद्रगुप्त याची नात (चंद्रगुप्त दुसरा याची मुलगी). वाकाटक राजवंश हा शैवधर्माचे आचरण करणारा तर गुप्त घराणे वैष्णव. परंतू, वाकाटकांच्या राजघराण्यात प्रवेश करूनही प्रभावतीगुप्तने अखेरपर्यंत वैष्णवधर्माचे पालन केले. तिला तीचे धार्मिक स्वातंत्र्य वाकाटक राजवंशाने देऊ केले होते. इसवी सन ‘चौथ्या’ शतकाच्या अखेरची ही घटना, पण ‘आधुनिक’ काळापेक्षाही प्रगत विचारसरणीचे लक्षण यातून दिसून येते.
प्रभावतीचा राज्यकारभार
पुढे काही काळाने तिचा नवरा ‘रुद्रसेन’ मरण पावला. तेव्हा प्रभावतीने सारा राज्यकारभार एकहाती चालवला, तोही तब्बल दहा वर्षे! हा राज्यकारभार करण्यासाठी तीने मातीचा शिक्का करून घेतला होता, ज्यावर “श्री प्रभावतीगुप्तयाः” अशी ब्राम्ही लिपीमधील अक्षरे कोरलेली आढळतात. पतीच्या निधनानंतर राजकारभार पाहण्याची ही परंपरा फार प्राचीन आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन सम्राज्ञी ‘नागणिका‘ ने पतीच्या निधनानंतर कशाप्रकारे राज्य चालवले, याचा संपूर्ण इतिहासच नाणेघाटाच्या गुहेत कोरलेल्या शिलालेखांमधून वाचायला मिळतो. या नागणिकानंतर महाराष्ट्रात प्रभावशाली महिला शासक म्हणून ‘प्रभावतीगुप्त’ ठळकपणे आपल्या नजरेस भरते.
रामटेक आणि मनसर या दोन ठिकाणी वाकाटकांच्या धार्मिक विविधतेची झलक आपल्याला पाहावयास मिळते. रामटेक येथे असणारे केवल नृसिंह मंदिर, रुद्र नृसिंह मंदिर, वराह मंदिर, त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील आद्य-वैष्णवांचे ठळक उदाहरण म्हणून पाहीले जातात. केवल नृसिंह मंदिराचा इतिहास समोर येण्यामागेही एक रंजक गोष्ट दडलेली आहे. १९८२-८३ मध्ये डॉ. अरविंद जामखेडकर आणि त्यांची टीम रामटेक येथे असणाऱ्या मंदिरांची साफसफाई करण्यासाठी पोहोचले. नागपूरकर भोसले यांच्या काळात बऱ्याच मंदिरांना जिर्णोध्दाराची किनार लाभली होती. ‘मारुती मंदिराच्या’ भिंतीवरील चुन्याचा लेप काढत असताना गर्भगृहात दोन आणि मंडपात एक, असे ३ शिलालेख उजेडात आले.

गर्भगृहात असणाऱ्या मारुतीच्या मूर्तीवरील शेंदूर काढला, तर त्याच्या आतमध्ये आसनस्थ नृसिंहाची मूर्ती प्रकट झाली. (वरच्या फोटोमध्ये देण्यात आलेली मूर्ती) सिंहासनावर बसलेली अशी मूर्ती याआधी पाहण्यात आली नव्हती. जवळ जवळ सहा फूट उंचीच्या नृसिंहाने सर्वांना आश्चर्यचकित केले. मंडपात असलेल्या शिलालेखाचे वाचन झाल्यानंतर हे मंदिर प्रभावतीगुप्तने बांधल्याचे समजले. हा शोध अत्यंत महत्वाचा होता. चौथ्या-पाचव्या शतकात बांधलेले हे मंदिर, गर्भगृहात असणारी प्रतिमा हे सर्वकाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-धार्मिक इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. बाजूलाच असणारे मंदिर ‘रुद्र नृसिंह’, आपल्या पतीच्या स्मरणार्थ प्रभावतीने हे मंदिर बांधले होते.
महाराष्ट्रात ‘नृसिंह ‘ पूजेची सुरुवात करणारी व्यक्ती म्हणून प्रभावतीगुप्त अजरामर झाली. पूर्व महाराष्ट्रात वैष्णव पंथाचा प्रचार-प्रसार होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे प्रभावतीगुप्त. याचे धडधडीत उदाहरण म्हणजे रामटेक इथे बांधलेली मंदिरे तसेच तिच्या शिक्क्यावर असणारा शंख.. जो विष्णूच्या आयुधांपैकी एक आहे.

आजच्या युगात महिला सशक्तीकरण, स्त्रीवाद, स्त्रियांना सर्वच क्षेत्रात समान अधिकार, स्त्रियांचे शिक्षण यासाठी आपण लढा देतोय.
अजूनही खेडोपाडी ‘चूल’ आणि ‘मूल’ पुढे स्त्रियांचे विश्व नाही. आणि दुसरीकडे इसवी सनाच्या पाचव्या शतकात मध्यप्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि कर्नाटकच्या उत्तर भागावर प्रभावतीगुप्त राज्य करत होती.
तत्कालीन मध्यभारतातील अतिशय प्रभावशाली व्यक्ती म्हणून प्रभावतीगुप्तकडे पाहीले जाते. तब्बल दहा वर्षे एकहाती सत्ता राखत ताकदवान सम्राज्ञी म्हणून प्रभावतीगुप्त इतिहासाच्या पानांवर अमर झाली.
आपला इतिहास भविष्य उज्वल करण्यासाठी ऐन-केन प्रकारेन वाट दाखवतो, फक्त तो मार्ग पाहण्याची, समजण्याची आणि त्यापासून प्रेरणा घेण्याची आपली कुवत असावी.
म्हणूनच प्रभावतीगुप्ताची कथा प्रत्येकाच्या कानावर घातली गेली पाहिजे.
–केतन पुरी (लेखक प्रसिद्ध इतिहासअभ्यासक आहेत.)
https://ajintha.com/prabhavti-gupta/
इ.स. ४ थ्या शतकापासून ६ व्या शतकापर्यंत गुप्त राजांनी - माळवा, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या भागात राज्य केले. या काळातील आर्थिक, साहित्यिक, वैज्ञानिक, कला, स्थापत्य आदी प्रगती पाहता या काळाला भारताचे सुवर्ण युग मानले जाते.
४ थ्या शतकातील समुद्रगुप्त हा एक शूर सेनानी व उत्तम शासक होता. हा राजा स्वत: कवी होता, रसिक होता व तो विणा वादन सुद्धा करित असे. त्याने उत्तर व दक्षिण दिग्विजय करून गुप्त साम्राज्य वाढवले. अश्वमेध आदी यज्ञ केले. गुप्त साम्राज्य याच्या काळात भरभराटीस आले. त्याच्या नंतर, त्याचा पुत्र चंद्रगुप्त (दुसरा) गादीवर आला. सम्राट चंद्रगुप्तने माळवा येथील कार्दामक शकांचा पराभव करून भारताच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत गुप्त साम्राज्य वाढवले. इथल्या बंदरांमधून रोम बरोबर समुद्रमार्गे व्यापार होत असे. चंद्रगुप्तने शकांचा शत्रू म्हणून ‘शकारी’ हे बिरूद मिरवले. तसेच त्याने ‘विक्रमादित्य’ हे बिरूद सुद्धा धारण केले होते. या काळात पूर्वेला पाटलीपुत्र व पश्चिमेला उज्जैन या त्याच्या दोन राजधान्या होत्या. त्याच्या नंतर याचा पुत्र कुमारगुप्तने राज्य केले.
आजची कथा आहे, प्रवरसेनच्या रामायणाची ...
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. राम, सीता व लक्ष्मणाने अयोध्या सोडली व ते दक्षिणेकडे निघाले. गंगा नदी पार करून ते मंदाकिनी नदीच्या तीरावर चित्रकूट येथे आले. या ठिकाणी सती अनसूया व अत्रिमुनी यांचा आश्रम होता. कधी काळी कण्व ऋषींचा आश्रम पण मंदाकिनीच्या काठावर होता, जिथे दुष्यंत-शकुंतलेची भेट झाली होती. या रम्य परिसरात, राम, सीता व लक्ष्मण पर्णकुटी बांधून राहिले होते. चित्रकुट येथील वास्तव्यात भरत रामाचा शोध घेत इथे पोचला. रामाच्या पादुका घेऊन भरत परत गेला. अयोध्येच्या बाहेर नंदीग्राममध्ये संन्यस्थ वृत्तीने राहून, भरताने अयोध्येचा राज्यकारभार पहिला. अशा प्रकारे त्याने जणू आपल्या आईच्या पापाचे प्रायश्चित्त घेतले. या बंधूप्रेमाचे ‘भरत – मिलाप’ मंदिर चित्रकुटमध्ये पाहायला मिळते.
वाकाटक राजे रामगिरीला वारंवार जात असावेत. प्रभावती गुप्तच्या एका ताम्रपटावरील लेखात ती ‘रामगिरिस्वामी’ ला वंदन करते.
पावसाळा संपला आहे, शरद ऋतू सुरु झाला आहे. सीतेच्या शोध घेण्याकरिता सुग्रीव वानरसेनेला पाठवतो. ही सेना समुद्रासमोर हताश होऊन थांबते. यावेळी सुग्रीव त्यांना धीर देतो, प्रोत्साहित करतो. त्यावर हनुमान उड्डाण करून आकाशमार्गे लंकेत पोचतो. हनुमान सीतेच शोध लावून परत येतो. त्यावर सर्व सैन्यासह राम व सुग्रीव समुद्रापाशी पोचतात.
सेतुबंधवर एक राजस्थान मधील व एक दक्षिण भारतातील टीका उपलब्ध आहे. बाणभट्ट, दंडी आदी कवी सेतूबंध काव्याचा कौतुकाने उल्लेख करतात. सेतुबंधच्या हस्तलिखीताचे गोल्डस्मिथ यांनी १८८० मध्ये जर्मन भाषांतर करून ते प्रकाशित केले. भारतात १९३५ मध्ये रावणवहोचे भारतीय भाषांतर उपलब्ध झाले.
संदर्भ –
⦁ PRAVARSSENA'S SETUBANDHA - Krishna Kanta Handiqui
किल्ले रामटेक आणि गडमंदिर…..
आज विदर्भातील भटकी मंडळी किल्ले बघायचे झाल्यास पुणे-मुंबई-नाशिककडे धाव घेतात.अर्थात हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजाच्या पराक्रमाचे ,मराठा रियासतीचे जिवंत साक्षीदार असून आजही इतिहासाच्या स्मृती कवटाळून आहेत, एव्हाना ते एखाद्या तिर्थस्थळाहून तिळमात्र कमी नाही. हेच गडकिल्ले गेली कित्येक वर्ष या भूमंडळी सर्वास स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा ,प्रेरणा देते आली आहे . या गडवाटांची भुरळ कोणास का न पडावी ? पण या गडकिल्ल्यांना भेट देण्याचे भाग्य सर्वासच लाभते असे हि नाहीं.
मी मूळचा नागपुरकर असलो तरी माझी बरेच (बहुदा सर्वच) नातेवाईक हे बाहेरगाव राहत असल्यामुळे मला महराष्ट्राभर काहीनाकाही कारणांमुळे का होइना प्रवास आणि भटकंती करायला निमित्त नेहमीच मिळत आले आणि त्या संधी चा मी पुरेपूर फायदा घेत बरीच भटकंती केली आणि करतोय. आजवर जमेल तस जमेल तेव्हा आपली गाठोडी उचलून कधी नव्हे ते एकट्याने तर कधी दोस्तांच्या सोबतीने थोडेफार का होइना बऱ्यापैकी फिरलो त्यात गडकिल्ले हा तर अगदी शालेय जीवना पासूनच जिव्हाळ्याचा विषय. आजवर किती किल्ले पाहिले हे कधी मोजले नाही , एव्हाना ते कधी मोजावे सुध्दा वाटले नाहीत पण जे किल्ले पाहिले ते चिकित्सक दृष्टीने आणि अभ्यासक वृत्तीने पाहिले. किल्ले बघताना कायम ‘क’ ची बाराखडी तेवढी पाठ केलेली होतीच, म्हणजेच का ? कधी? केव्हा? कुठे? इत्यादी सारखी अगणित प्रश्न पडत गेली आणि मी उत्तर शोधायला पुन्हापुन्हा या गडकिल्ल्यांच्या प्रेमात पडत गेलो… गडवाटा तुडवत राहिलो.

हल्ली करियर आणि जवाबदारीच्या ओझ्याखाली वावरत असतांना आता पूर्वी सारखी भटकंती करायला आवड असुनही सवड मिळत नाही. त्यात सुट्ट्याची बोंब. माझ्यातल्या मी मला स्वस्थ बसू देइल तर नवल, म्हणुन जवळपास कुठे जाऊन दुधाची तहान ताकावर भागवण्याचा केविलवाणी प्रयत्न करत राहतो.
आपल्या विदर्भात काहीही नाही, ना समुद्र, ना सह्याद्री, ना डोंगररांग, ना गडकिल्ले काही काही नाही इत्यादी बोंब ठोकनाऱ्या अनेकांनान सारखे मी सुध्दा या गटाचे प्रतिनिधित्व करत होतो, कारण उपलब्ध नसलेली माहिती , वाचनाची नसलेली सवय , दुर्लक्षित ठिकाणे इत्यादी गोष्टींमुळे हे असे बोल सहाजिक होते आणि त्यावेळी Internet mobile, Youtub Facebook, google etc असले काहीही जवळ नव्हते त्या मुळे या संबंधित माहिती मिळवणे देखील अवघड काम होत , म्हणून मी कधी काळी , या भागात काहीही नाही ! असे गाऱ्हाणे करनाऱ्या पैकी एक होतो आता मात्र ते विधान सफसेल खोटे ठरले . कारण या मातीला देखील पराक्रमी इतिहास लाभला आहे, इथे जितके ,जेवढे, आणि जसे किल्ले आहे त्याची तुलना कुणाशीहीच होउ शकत नाही.असा माझा ठाम विश्वास आहे , या गडकोटाची इतिहासात भरीव योगदान राहिले आहे. अगदी नागपूरकर भोसल्यांनी कावेरी नदी ओलांडून कलकत्ता उडीसा मद्रास कुठवर कुठवर आपल्या पराक्रमाची मोहर मराठा साम्राज्यात उमटवली. ह्याच इतिहासातील पाऊलखुणा शोधायला मी या गडकिल्ल्यांची वाट धरली आणि भटकंती करायला सुरवात केली…

कधीकाळी एखाद्या साधकाला आपल्या साधनेमुळे भगवंताचा
साक्षात्कार व्हावा तदवत माझी अवस्था रामटेक आणि किल्ले नगरधन या दोन
किल्ल्याना भेटून झाली. तेव्हा मला क्षणार्धात संग्रामदुर्ग उर्फ चाकण या
भूईकोट किल्ल्यांची आठवण तेव्हा झाली. दोन्ही भूईकोटाच्या बाबतीत तरी
चाकणच्या किल्ल्यांसारखी आजची दुरावस्था या किल्ल्याच्या वाट्याला आलेली
नाही. त्यासाठी पुरातत्त्व खात्याला धन्यवाद द्यावेसे वाटतात. पण न राहून
हा प्रश्न भेडसावत होता कि हा किल्ला मानवी आक्रमणापासून आणि
प्रसिध्दीपासून अलिप्त असल्यामुळे तर नाही ना एवढा नीटनेटका सु-स्थितीत
असावा ? कारण आज किल्ल्याकडे बघता खरी वाताहात तर हि आपल्या स्वकीयांच्या
करंटे पणा आणि आपल्या नाकर्तेपणामुळेच झालेली आहे.त्याचे कोणास ना
सोयरसुतुक ना जाणीव…..

नागपूरपासुन अवघ्या साठ किलोमीटर वर गड मंदिर रामटेक व नगरधन हे
अतिप्राचीन गाव आहे आजवर मी कित्येकदा या ठिकाणी भेट दिली ती
इतरांनप्रमाणेच केवळ एक धार्मिक स्थळ किवां सहलीच्या निमित्ताने, पण आताची
भेट हि एक नवी माहिती गाठीशी असल्यामुळे विशेष होती. रामटेक आणि किल्ले
नगरधन हे २ सुंदर किल्ले आहेत. त्यापैकी रामटेक किल्ला व रामटेकच्या
पायथ्याशी असलेले अंबाळा सरोवर पुराण काळापासून धर्मक्षेत्र म्हणून
प्रसिध्द आहे. त्यात रामगिरी तर प्राचीन काळापासून धर्मस्थान आहे .

रामाने या ठिकाणी विश्रांती घेतली होती. बौध्द तत्वज्ञ नागार्जून यांनी काही काळ तेथे वास्तव्य केले. कालिदासांना त्यांचे मेघदूत हे काव्य याच डोंगरावर सुचले अशी आख्यायिका आहे. श्री चक्रधर स्वामी यांनी या गडावर धार्मिक उपदेश केला. संत तुकडोजी महाराज यांनी या गडावर ध्यान साधना केली. रघुजी भोसले यांनी गडावरील व अंबाला सरोवर परीसरातील मंदिरांचा जिर्णोध्दार केला. पुराण काळापासून पेशव्यांच्या पर्यंत हा किल्ला नांदता होता. आज त्यावरील राममंदिरामुळे तिर्थस्थान म्हणून हा गड प्रसिध्द असला तरी इतिहासाच्या पाऊल खुणा कवटाळून उभा आहे. त्याची प्रचिती जागोजागी दिसून येते येवढी हि पवित्र जागा. या भागाला गौरवशाली इतिहास लाभला आहे. इतिहासाची ही नाळ आपल्याला थेट तिसऱ्या शतकापर्यंत घेउन जाते. तो इतिहास समजायला लागला कि त्याच्या पाउलखुणा शोधायची उत्सुकतेनेच मला गडमंदिर किल्ले रामटेकची वाट दाखवली.

आणि मी त्या नंतर सारखा इथे येत राहिलो. त्यातील नगरधन किल्ल्याच्या बद्दल विस्तारानेंच बोलावे लागेल.

प्रथमदर्शनी दिसणारे रामटेक किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज.आज गडावर जाण्यासाठी चार दिशेने पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या मुख्य दारापर्यंत बसची सोय आहे. किल्ल्याचे पश्चिमाभिमूख प्रवेशव्दार १२ फूट उंच आहे.या दरवाजाला वराहा दरवाजा असे म्हणतात. दरवाजा अतिभव्य व ऐटदार आहे. इथे उंबरठ्यावरच अनेक माकडे आपल्या स्वागतासाठी हजर असतातच.त्याच्या मार्फत आधी आपली नखशिखांत झडती होते. खाण्याच्या वस्तू त्यापुढे रित्या केल्या कि तरच काय ती पुढची वाट मोकळी होते..

प्रवेशव्दारातून आत आल्यावर उजव्या बाजूला चक्रधर स्वामींचे मंदिर आहे आणि उजवीकडे एक सलग पाषाणातील १८० सेंटीमीटर (सहा फुट) उंचीची वराह मूर्ती आहे. या वराहाच्या पोटाखालून जो रांगत जाईल तो पुण्यवान समजला जातो. असा समज आहे.

डावीकडे पुढे गेल्यावर मुख्य किल्ल्याची तटबंदी साधारणपणे: तीन मीटर
(दहा फूट) जाड आहे. दरवाजा दोन बुरूज व निगराणीची तटबंदी आहे. या
तटबंदीला जंग्या म्हणजे शत्रूवर बंदुका व बाण मारण्याच्या तसेच गरम तेल
ओतण्याच्या छोट्या खिडक्या आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला गावात
उतरण्यासाठी पायर्या आहेत.

पुढे किल्ल्याचा दुसरा दरवाजा लागतो तो दक्षिणाभिमूख असून त्यावर
नगारखाना आहे. या प्रवेशव्दारावर चढून जाण्यासाठी जिना आहे. या जिन्याने
दरवाजाच्या वरचा बाजूस जाऊन दरवाजा ओलांडून डाव्या बाजूच्या बुरुजावर जावे.
या बुरुजावर झेंडा लावलेला आहे. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग असून त्यावरून
संपूर्ण किल्ला व खालचे रामटेक गाव यांचे विहंगम दृश्य दिसते. तसेच नगरधन
किल्ल्याचेही येथून दर्शन होते.

इथून पुढे गेल्यास किल्ल्याचे तिसरे गोपाळद्वार लागते ते
पूर्वाभिमूख असून आतल्या बाजूस देवड्या आहेत. प्रवेशव्दारच्या आत मंदिर
संकुल आहे. या संकूलात जाण्यासाठी एका गोपूरातून जावे लागते. हेमाडपंथी
रचना असलेल्या या गोपूरावर शिल्प कोरलेली आहेत. गोपूराच्या बाहेर डाव्या
बाजूस दशरथ मंदिर आहे. त्याच्या व्दारपट्टीवर शिल्प कोरलेली आहेत.
ते तीन मजली दगडी बांधकाम असून आतील बाजूस अतिशय कोरीव सुबक
रेखीवकाम केलेल दिसून येते. दशरथ मंदिरामागे पाण्याचा मोठा बांधीव तलाव
आहे. या तलावावर एक घुमटी आहे. तलावात उतरण्यासाठी दोन बाजूस जिने आहेत. या
तलावा मागिल जिन्याचा मार्ग रामटेक गावात उतरतो.
जवळच भलीमोठी तोफ ठेवलेली आहे. त्यानंतर अनुक्रमे,

मंदिर संकुलात प्रथम लक्ष्मणाचे मंदिर आहे. त्यामागे रामाचे मंदिर
आहे. या दोनही मंदिरात नागपूरकर भोसल्यांनी वापरलेली शस्त्रे कपाटात
ठेवलेली पहायला मिळतात. राम मंदिराच्या मागे लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे.
या मंदिराच्या गच्ची वरून रामटेक गाव व दूरचा परीसर दिसतो.

या किल्ल्याला खालच्या बाजूस अजून एक तटबंदी असून, ती तटबंदी कालिदास स्मारकापासून सुरु होऊन संपूर्ण किल्ल्याला वेढा घालून वराह मंदिराच्या मागिल बाजूस असणार्या टेलिफोन टॉवर पर्यंत आहे.संपूर्ण किल्ला आणि मंदिरे वाळूच्या गदडापासुन (Sand Ston) बांधली आहेत. गडमंदिराला फेरफटका मारून आपण परतीच्या मार्गावर जाते वेळेस मुख्यदरवाज्यातुन बाहेर पडताच डाव्याबाजूस मोठे कुंड असून ते बहुदा जलविहाराचे ठिकाण असावे. या कुंडाला उतरायला पायऱ्या आहेत.अनेक कोरिव खांब असलेले दालन आहेत.

रामटेक हा अतिशय सुंदर आणि सुस्थितीतल किल्ला असला तरी जनसामान्यांना
त्याचे महत्व राममंदिर म्हणूनच आहे, टिपुर पौर्णिमेला मोठा उत्सव या गडावर
होत असतो तेव्हा मोठ्याप्रमाणावर लोकांच्या गर्दी येते जमते.क्वचितच
लोकांना हा एक किल्ला आहे याची माहिती असते. काळाच्या ओघात आणि
नूतनीकरणाच्या नावाखाली गडाचे जुने स्वरूप लोप पावले आहे.एक दुर्गप्रेमी
म्हणून त्या गोष्टींची खंत वाटत राहते. गडमंदिराचा परिसरात अनेक वास्तू
आजही गुढरहस्यासह इतिहासाच्या पाऊलखुणा कवटाळून आहेत, मात्र तेवढ्याच
दुर्लक्षित…..

त्यातीलच एक ‘कपूरबावडी’ हे ठिकाण
देवाने ओढवलेल्या विद्रूपीकरणाचा कळस झाला कि जीर्णोद्धाराचे युग सुरु होत असे म्हणतात मग त्याला अपवाद हे का असावे, दगडावर दगड रचत कुठलेही Bonding Material न वापरता बांधलेले हे हेमाडपंती मंदिर वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे…
निसर्गरम्य ठिकाण, निरव शांतता, या परिसराच्या सुंदरतेत अजुन भर घालते. या मंदिरा समोरील या विहिरीच्या पाण्याचा हिरवा रंग आणि त्यात दिसणारे मंदिराचे प्रतिबिंब नितांत सुंदर दिसते. या विहाराच्या तळाची अजूनही निश्चित खोली माहिती नाही आणि पाण्याच्या रंग हा कायम हिरवाच असतो आणि त्यातले पाणी आजवर कधीही न आटल्याचे सांगण्यात येते पुरातत्त्व खात्याच्या मार्फत या पाण्यावर विशेष संशोधन सुरु आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात भवानी देवी, आणि शिवलिंग आहे. गाभारा आटोपशीर असून अतिशय भक्कम बांधणीचा आहे. पण हे सगळे कधीपर्यंत तग धरुन राहतील याची आज निश्चित खात्री नाही. हा वारसा शेवटचा घटका मोजत आहे. वेळीच त्याकडे लक्ष देउन त्याची देखभाल योग्य ती काळजी न घेतल्यास हे सारे लोप पावण्याच्या मार्गावर आहे. गरज आहे ती योग्य ते पाऊल उचलण्याची…..
रामटेक गडमंदिराच्या मागच्या बाजूस एक रस्ता जैन मंदिराकडे जातो त्याच रस्त्याने पुढे गेल्यास आपण डाव्या हाताला वळतो तो रस्ता या ठिकाणी येउन थांबतो या परिसर कधी गेलात तर या स्थळाला नक्की भेट द्या निसर्गाशी एकरूप झाल्याचा भास नक्की होइल… तुम्हाला हे ठिकाण आवडेल याची खात्री नाही पण या ठिकाणावर तुम्ही आलात हे त्या निर्मात्यास नक्की आवडेल…
https://vishaldeokarsite.wordpress.com/2017/07/14/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF/
कवडसा- आडवाटेवरचा खजिना-६ श्रीराम मंदिर, रामटेक
श्रीराम मंदिर, गड रामटेक
जिल्हा- नागपूर
बालपणी शाळेच्या पुस्तकात पाहिलेलं रामटेक आज नजरेसमोर होतं. खरं तर नागपूरहून रामटेकचं श्रीराम मंदिर पाहायला आलो होतो. रामटेक म्हणजे श्रीराम मंदिर एवढंच डोक्यात होतं, पण वाकाटकांच्या साम्राज्यात कधी गेलो कळलंच नाही. रुद्र नरसिंह, केवल नरसिंह, सिंदूर बावली आणि त्रिविक्रम मंदिर हा ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे गावलेला खजिना. त्याबद्दलची स्वतंत्र पोस्ट याच ब्लॉगवर आहे.
आपल्या वनवासकाळात श्रीरामांनी या डोंगरावर काही काळ वास्तव्य केले होते; त्यावेळी इथे असलेल्या ऋषीमुनींना राक्षसांच्या त्रासापासून सोडवण्यासाठी श्रीरामांनी प्रतिज्ञा केली. टेक म्हणजे प्रतिज्ञा. तेव्हापासून हा डोंगर रामटेक या नावाने ओळखला जातो.
सिंदूर बावलीच्या समोरून एक वाट गडमंदिरापर्यंत जाते. पहिला दरवाजा, वराह दरवाजा. एखाद्या गडकोटाला शोभेल असा. पायर्या चढून वर येताच पांढरं शुभ्र धोतर नेसलेले एक वयस्कर काका डावीकडे बसलेले दिसले, स्थानिक होते. त्यांच्याकडून मंदिराची काहीतरी माहिती मिळेल म्हणून मीच बोलायला सुरवात केली.
“ ये बहुत पुराना मंदिर है, रघुजी भोसलाने जो बंगाल की लूट लाई थी उसमें से कुछ हिस्सा इस मंदिर और अन्य कुछ मंदिरों पर खर्च कीया था, इसकी तटबंदी उन्होने ही करवाई।" काकांनी सांगायला सुरुवात केली.
आणखी बर्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या “और वो सामने वराह शिल्प जो है उसके पेट के निचे से जाना।"
त्यांनी त्या वराह शिल्पाच्या पोटाखालून जायला सांगितलं खरं पण मी ते मनावर न घेता तिथून उठलो आणि त्या भव्य वराहशिल्पाजवळ आलो. हे तौलनिक दृष्ट्या साधे मंदिर असून चार रुचक प्रकारचे स्तंभ असलेला मंडप असे त्याचे स्वरुप आहे. चौरस स्तंभ दोन कमलतबकांनी सुशोभित केलेले आहेत. त्याचे फोटो काढण्यात मग्न असतानाच त्या चौथर्यावर बसलेली मुलं म्हणाली “वो देखो, वो काका तुम्हे बुला रहे हैं"
“अरे जाओ... जाओ।" काका लांबून हाताने इशारा करत होते. वरहाच्या पोटाखालून मला जाताना बघण्यात काकांना एवढा इंटरेस्ट का ते नंतर कळाले.
एरव्ही त्या वराहच्या पोटाखालून जाण्याचा माझा काही विचार नव्हता, पण मी वराहच्या पोटाखालून जाऊ शकतो की नाही हे पाहत ते उभे होते. त्या बुजुर्गाचं मनही मोडवत नव्हतं. मी अगदी विनासायास लीलया त्या वराहच्या पोटाखालून बाहेर पडलो तसे ते काका पुढे जायला निघाले. बालहट्ट पाहिला होता, हा असा बुजुर्ग हट्ट पहिल्यांदाच.
पहिला वराह दरवाजा वराह मंदिर
दुसर्या सिंधपूर दरवाजातून आत आलो, समोर मोठं प्रांगण, दोन्ही बाजूला दुकाने, समोर किल्ल्याला शोभेल असा लाखेचा थर चढवलेला आणखी एक भव्य भैरव दरवाजा, दोन्ही बाजूला एखाद्या किल्ल्याला शोभतील असे बुरुज. भैरव दरवाज्यच्या अलिकडे डावीकडे सरबताच्या दुकानातल्या खुर्चीवर काका बसले होते. मी दिसलो तसा मलाही सांगितले बसायला. साधारणतः ऐंशी वर्षांचे ते काका श्रीरामाचे भक्त असावेत, काही पावले चालल्यावर थांबत, बसत, मग पुढे जात. काही वेळाने त्यांना तिथेच सोडून मी तो भव्य भैरव दरवाजा ओलांडून पुढच्या प्रांगणात आलो. इथेही दोन्ही बाजूला दुकाने, आणि समोर गोकुळ दरवाजा... गोकुळ दरवाजावरची कलाकुसर लक्षवेधक आहे, पुरातन शिल्पांची काही प्रमाणात झीज झाली आहे, गोकुळ दरवाजा हाच एक खजिना आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या दरवाजातून आत शिरताच रामटेक डोंगराच्या पश्चिम टोकावर उभारलेला मंदिरांचा समूह नजरेसमोर येतो. उजवीकडे श्री हनुमान मंदिर त्याच्या पुढ्यात श्री लक्ष्मण मंदिर आणि लक्ष्मण मंदिराच्या मागे श्रीराम मंदिर. नागर शैलीत उभारलेल्या मंदिरांचा सुंदर समूह.
रामटेक मंदिर समूहश्री हनुमान आणि श्री लक्ष्मण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मी श्रीराम मंदिरात आलो, सुंदर मंदिर. सभामंडप मोठा आहे. डावीकडे भोसले नागपूरकर गादीच्या वारसांच्या तसबिरी तसेच तलवारी, ढाल, बंदुका आणि इतर शस्त्रे मांडण्यात आली आहेत. गर्भगृहातील वनवासी वेशातल्या काळ्या पाषाणातल्या सीतामैया श्रीरामासमोर हात जोडून उभा असतानाच आरती सुरू झाली. आरती संपताच हातात तिळगुळाची वडी प्रसाद म्हणून मिळाली, खूप स्वादिष्ट होती. तिथून बाहेर पडून मी ती मंदिरं न्यहाळू लागलो, खूप सुंदर, मातकट झाक असलेली शुभ्र नागर वास्तूकला.
श्रीराम मंदिराला लागून असलेल्या मनोर्यातून दिसणारे रामटेक.
वाकाटककाळामध्ये गडावर श्रीरामचंद्रांच्या पादूकांची पुजा केली जात असे. या पादुकांची प्रतिष्ठापना वाकाटक राणी प्रभावतीगुप्ता हीच्या काळात झाली याविषयीचा उल्लेख ऋध्दापूर येथे सापडलेल्या ताम्रपटात आला आहे. गडावरील राम मंदिर हे एक महत्वाचे स्थान असून तेराव्या शतकातील आहे. तथापि मंदिरातील मूर्तींची पुन:स्थापना प्रथम रघुजी भोसले यांच्या काळात १७५३ साली करण्यात आली. (रघुजी भोसले... अठराव्या शतकातील मध्य भारतातलं एक प्रभावी व्यक्तिमत्त्व, अगदी बंगालपर्यंत नावाचा दबदबा असणारं.) याविषयीची नोंद नागपूरकर भोसले यांच्या शकावलीवरून मिळते. रघुजी भोसले प्रथम यांना देवगड स्वारीत मिळालेल्या विजयानंतर त्यांनी जयपूरहून नवीन मूर्त्या मागविल्या, परंतु त्या नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याआधी अचानकपणे शरयू नदीत मिळालेल्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली, याविषयीची नोंद उपलब्ध आहे.
मंदिरे नागर प्रकारची असून राममंदिरच्या पुढच्या बाजूस मुखमंडप आणि त्याच्यापेक्षा मोठे दोन बाजूस दोन अर्धमंडप आहेत. गर्भगृहाचे दरवाजे चांदी व पितळेने मढवलेले आहेत.
खरं तर जिथे राम सीता, लक्ष्मण तिथे. पण विशेष म्हणजे गडावर श्रीराममंदिराच्या पुढ्यातच लक्ष्मणस्वामींची वनवासी वेशातली मूर्ती असलेले स्वतंत्र मंदिर आहे. सभामंडप आठ स्तंभांवर उभा असून सभा मंडपाच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर यादव राजा रामदेवराय (इसवी सन १२७१ - १३१२) यांच्यावेळचा शिलालेख कोरलेला आहे.
राममंदिराला लागून उजव्या हाताला एक मनोरा आहे. मनोरा चढल्यावर तिथून खालचा रामटेकचा विहंगम परिसर नजरेत भरतो, उत्तरेला जैन मंदिर लक्ष वेधून घेते. मनोर्याच्या समोर भोसलेंचा महाल आहे. गडावर श्रीरामाच्या दर्शनासाठी आले की ते या महालात थांबत. मनोरा उतरून खाली आलो, तेव्हा मघाशी दिसलेले काका श्रीराम मंदिराच्या पायर्यांवर झाडलोट करताना दिसले.
अं हं! श्रीरामाचा एक सच्चा भक्त दिसला.
मुख्य मंदिर पाहून झाल्यावर मी तो परिसर फिरू लागलो. मंदिर परिसरात अगस्ति श्रृषींचा मठ आहे, इथे अखंड ज्योत तेवत असते. दोनशे तीनशे वर्षांपूर्वीची त्याकाळी वापरात असलेली काही हत्यारे, तलवारी, तंतूवाद्ये भिंतीवर टांगून ठेवण्यात आली आहेत.
गोकुळ दरवाजाचं सौंदर्य पुन्हा एकदा डोळ्यात साठवून घेतलं. दरवाजातून बाहेर आल्यावर दक्षिणेला रामकुंड आहे तर थोडं खाली उतरल्यावर सीताकुंड, किंवा सीतेची न्हाणी. या स्थानाचा उल्लेख स्थानपोथी या ग्रंथात आलेला आहे, तसेच ‘जनकतनयास्नानपुण्योदकेषु'(ज्यामधील जल सीतामातेच्या स्नानामुळे पवित्र झाले आहे) असे वर्णन कालीदासांनी केले आहे. सीताकुंडाजवळून एक वाट खाली उतरते. इथला परिसर एखाद्या किल्ल्याला शोभेल असाच. इथून वर दिसणारा श्रीराम मंदिराचा कळस, आणि खाली दक्षिणेला पसरलेला रामटेकचा परिसर लाजवाब.
अगस्ति ऋषींच्या आश्रमात जतन करून ठेवण्यात आलेली काही दुर्मिळ तंतू वाद्ये.
वाकाटककालीन रुद्र नरसिंह मंदिर, केवल नरसिंह मंदिर, सिंदूर बावली, त्रिविक्रम मंदिर, कालीदास स्मारक, वराह मंदिर, महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामींचा संबंध आलेले भोगराम मंदिर, तसेच चार दरवाजे, दुहेरी तटबंदी, नक्षीबंद कमानी, रामकुंड, सीतेची न्हाणी, गोकुळ दरवाजावरील नक्षीकाम आणि शिल्पकला, नागर शैलीतील वास्तूकलेचा उत्तम नमुना असलेला भारतभरात एकमेकाद्वितिय असलेला हा रामटेकवरील प्राचीन मंदिरांचा समूह एकदातरी आयुष्यात आडवाट करून बघण्यासारखा.
दुपारचे दीड वाजले होते, गड रामटेक फिरून झाला होता. मघाशी पहिल्या दरवाजापाशी वराह मंदिराजवळ जे काका बसले होते तिथे आलो. लक्ष समोरच्या कट्ट्यावर गेले. एक भलंमोठं कुटुंब कट्ट्यावर बसलं होतं. कमावते आईवडिल सकाळीच पोटाची व्यवस्था करायला गेले होते, आपली चिलीपिली, घरातल्या म्हातार्याकोतार्यांकडे सोपवून, मन घट्ट करून... त्यातल्या एका पिटुकल्याची दोरखंडाबरोबर धमाल मस्ती चालली होती. ती मस्ती मन लावून बघत असतानाच कुठूनतरी एक आई आली... जणू काही खूप दिवसांनी भेटतेय... तिने आल्याआल्याच आपल्या बाळाला उचलून घेतलं... पटापट चारपाच वेळा त्याच्या गालाचे मुके घेतले... आणि ...छातीशी कवटाळलं.
मी आ वासून पाहतच राहिलो ते ओतू चाललेलं मातृत्व.
असं हे रामटेकचं महात्म्य!
_विजय सावंत
स्थळभेट - १६/०१/२०२०
फोटो - विजय सावंत
https://k3marathi.blogspot.com/2020/10/blog-post_24.html
रामटेक
नागपूर जिल्ह्यातील पवित्र व निसर्गरम्य स्थान. लोकसंख्या १६,७३३ (१९८१ अंदाज). हे नागपूरच्या ईशान्येस रस्त्याने ५५ किमी. वर आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मनसर या ठिकाणाहून येथे रस्ता जातो. नागपूरशी हे लोहमार्गानेही जोडलेले असून अंबागड टेकड्यांच्या पायथ्याशी आहे.
रामटेक म्हणजे ‘रामाची टेकडी’; रामाने वनवासकाळात या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली म्हणून यास रामटेक नाव पडले, असेही म्हटले जाते. या टेकडीवर विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला व त्याच्या रक्ताने येथील दगड तांबडे झाले म्हणून यास ‘सिंदुरगिरी’ असेही नाव पडले आहे. ‘रामगिरी’, ‘तपोगिरी’, ‘काशीचे महाद्वार’ असेही याचे उल्लेख आहेत. ‘सिंदुरगिरी’ व ‘तपोगिरी’ ही दोन्ही नावे येथील लक्ष्मण मंदिरावरील कोरलेल्या एका यादवकालीन शिलालेखात (तेरावे शतक) आढळतात.
रामटेक या १५२ मी. उंचीवर असलेल्या टेकडीवर चौदाव्या शतकातील बरीच मंदिरे आहेत. या टेकडीला चारी बाजूंनी कोट असून त्याला अनुक्रमे वराह, भैरव, सिंगपूर आणि गोकुळ असे चार दरवाजे आहेत. आवारात प्रथम दशरथ व वसिष्ठ मुनी यांची मंदिरे असून नंतर राम-सीतेचे मंदिर आहे, परंतु भक्तगण प्रथम धूम्रेश्वर महादेवाचे दर्शन घेऊनच श्रीराम मंदिरात दर्शनास जातात.
राममंदिरात राम-सीता यांच्या काळ्या दगडातील, वनवासी वेषातील रम्य मूर्ती आहेत. त्या दुधाळे तलावात मिळाल्याचे म्हटले जाते. या मंदिरासमोरच लक्ष्मणाचेही मंदिर असून, गोकुळ दरवाजा व लक्ष्णण मंदिर यांवरील कोरीव काम विशेष लक्षणीय आहे. यांव्यतिरिक्त अन्य काही मंदिरेही आवारात आहेत.
मंदिरासमोरच एक कुंड असून, ते सीतेची न्हाणी म्हणून ओळखले जाते. येथे रामनवमी व त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी मोठ्या जत्रा भरतात टेकडीच्या पायथ्याशी एक जुने कलंकीचे मंदिर व मध्ययुगीन नागर शैलीत बांधलेली काही जैन मंदिरे आहेत.
रामटेकमध्ये माणिकताल व मथुरासागर अशा दोन बागा आणि २७ तलाव असून त्यांपैकी अंबाला तलाव सर्वांत मोठा आहे. या तलावाच्या काठावर आधुनिक पद्धतीने बांधलेली अनेक प्रेक्षणीय देवालये असून सकाळच्या प्रहरी या देवालयांवर सूर्यकिरणे पडून चमकू लागली म्हणजे तलाव व देवालये यांचे एकंदर दृश्य अतिशय मनोहारी बनते.
या मंदिरांमध्ये एक अप्रतिम सूर्य मंदिरही आहे. अंबाला तलावावर एकूण आठ घाट बांधण्यात आले असून त्यांना अष्टतीर्थांची नावे देण्यात आली आहेत. येथे १८६७ साली नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.
तीर्थक्षेत्राखेरीज आसमंतीय मँगॅनीजच्या खाणी यांमुळे रामटेकला विशेष महत्व आले आहे. येथील पानमळे प्रसिद्ध असून ही पाने पुण्या-मुंबईला निर्यात होतात.
येथील नयनरम्य सृष्टीसौंदर्य पाहून कविश्रेष्ठ कालिदासाला मेघदूतासारखे खंडकाव्य स्फुरले, तर कवी अनिलांनी येथील त्रिविक्रम वामनाचे मंदिर पाहून भग्नमूर्ति हेखंडकाव्य लिहिले.
खंडकर, प्रेमलता
प्रभू रामाचे वनवास स्थळ रामटेक – शहरे आणि गावे
वनवासात असताना प्रभू रामाचंद्राचे रामटेक परिसरात वास्तव्य होते. त्यामुळे या ठिकाणाचे नाव रामटेक ठेवले गेले. या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे ६०० वर्षे पुरातन ऐतिहासी मंदिर आहे. नागपूरकर भोसल्यांचा खास शास्त्रसाठा या मंदिरात असून, इ. स. २५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता. प्रचीन स्थळ म्हणून रामटेकला विषेश महत्व आहे.
वनवासाच्या काळात श्रीरामांनी या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती असे म्हटले आहे. रामटेकच्या जवळच महान अगस्त्य ऋषींचे आश्रम होते, अशीही आख्यायिका आहे. या आश्रमात ऋषी तप करायचे आणि राक्षस त्यांची तपश्चर्या उद्ध्वस्त करायचे. भगवान श्रीरामांनी संपूर्ण सृष्टी राक्षसांपासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा येथे घेतली. स्थानिक भाषेत टेकचा अर्थ प्रतिज्ञा असा होत असल्यामुळे या जागेला रामटेक असे नाव पडले. असेही म्हटले जाते की रामटेक येथे जो कुणी प्रतिज्ञा घेत असतो त्याची प्रतिज्ञा पूर्ण होत असते.
देवगड किल्ला सर केल्यानंतर नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराची स्थापना केली असल्याचे म्हटले जाते.
महान कवी कालिदास यांच्या वास्तव्यामुळेही या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. रामटेकच्या टेकडीवर बसूनच कालिदासांनी ‘मेघदूतम’ लिहिले आहे.
दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढविली होती
.https://www.marathisrushti.com/cities/ramtek-nagpur-shree-ram-stayed-here/
नरसिंहाचे आपण अनेक प्रकारची शिल्पे पाहिली असतील..
पण केवल नृसिंह हे त्यातील एक दुर्मिळ शिल्प..
नागपुर पासून जवळपास 40-50 किमी अंतरावर असणाऱ्या आणि भोसल्यांच्या स्थापत्यकलेने नटलेल्या 'रामटेक' शहरातील एक पुरातन मंदिर..
80 च्या दशकपर्यंत एक फार मोठे शिल्प स्थानिकांकडून पूजले जायचे.
लोकांच्या-भक्तांच्या मते ते एका मारुतीचे शिल्प होते.
पुण्यातील ज्येष्ठ इतिहास व पुरातत्व अभ्यासक जामखेडकर सर हे या हनुमानाच्या मंदिरात एका सर्वेक्षणासाठी आले होते.मंदिरातील साऱ्या भिंतीवर चुनखडीचा मोठा लेप देण्यात आलेला होता,ज्यामुळे मंदिरातील स्थापत्यशिल्प आणि कलेवर त्याचे दुष्परिणाम झाले असते,म्हणून ते साफ़ करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले,आणि ह्याच कामात अचानक हाती आला एक मोठा ठेवा..
इसवी सन तिसऱ्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या विदर्भ आणि थोड्याफर प्रमाणात मध्य महाराष्ट्रात एक शक्तिशाली साम्राज्य उदयास आले.दोन शाखांमधे विभागल्या गेलेले 'वाकाटक' घराणे म्हणजे एक प्रतिष्ठीत घराणे..
ह्याच घराण्यातील 'वत्सगुल्म' शाखेच्या राजांनी अजिंठा लेणीमधे आपल्या कलेची छाप उमटवली.आणि दुसऱ्या 'नंदिवर्धन' शाखेने विदर्भात अभुतपूर्व राज्यक्रांति केली.
गुप्त घराण्याशी वैवाहिक संबंध जोडून आपल्या साम्राज्याची सीमा वाढवणाऱ्या या शाखेची सून म्हणजे "प्रभावतीगुप्त"..!!
आणि तीच्या कारकिर्दीमधे हे मंदिर बांधण्यात आल्याचे उलेख मंदिरातील शिलालेखात आढळून आले.
मंदिर संवर्धन करत असताना अचानक हाती आलेल्या ह्या शीलालेखामुळे इतिहास बदलला.
वाकाटक साम्राज्याने मंदिर बांधल्याचा पहिला पुरावा हाती आला.पुरातत्वाची मदत घेऊन इतिहासचे नवे पैलू उलगडल्या गेले.
आतल्या मुर्तीवर चढवलेला शेंदुराचा थर काढण्यात आला,आणि समोर आले हे अतिविशाल शिल्प..
हे शिल्प मारुतीचे नसून,नृसिंहाचे होते.जवळ जवळ 6 फुट उंचीच्या ह्या शिल्पात असणारी अखंड नृसिंहाची मूर्ती निव्वळ अद्भुत आहे.हातात चक्र असल्याने ह्या मूर्तिला 'चक्रपाणी' ह्याही नावाने ओळखतात.
लक्ष्मीशिवाय असणाऱ्या ह्या शिल्पाचा उल्लेख 'केवल नृसिंह' असा केला जातो.
आज ही जागा पुरात्तव खात्याच्या अखत्यारित्या आहे आणि त्याचमुळे ही मूर्ती,मंदिरातील शिलालेख सुस्थितीत आहेत.
पण लोकांची ह्या मारुतीवर श्रद्धा एवढी,की अगदी हुबेहुब ह्या शिल्पासारखे छोटे शिल्प तयार करुण आणून,मंदिराच्या समोरच छोट्या मंदिरात स्थापन करुण त्याला शेंदुर लावला आणि त्याची अजूनही मारुती म्हणूनच पूजा केली जाते..!!
ह्याच मंदिरापासून थोड्या दुरवर अजून एक नृसिंहाचे मंदिर आहे.त्यातील शिल्पही तेच,मंदिर बांधनीही तीच आणि नृसिंहही एकटा..पण ह्याचे नाव 'रूद्रनृसिंह'
प्रभावतीगुप्त हिने तीच्या पतिच्या,रुद्रसेना याच्या स्मृतीमधे हे मंदिर बांधले होते.
5 व्या शतकापर्यंत मध्य भारतावर जवळ जवळ 250 वर्षे राज्य केलेल्या ह्या साम्राज्याचे स्थापत्यकलेतील योगदान उलगडले आणि समोर आला एक वैभवशाली इतिहास..!!
- केतन पुरी
छोटी पहाड़ी पर बना है रामटेक मंदिर, वनवास के दौरान भगवान राम रुके थे यहां
भारत एक प्राचीनतम सभ्यता वाला सांस्कृतिक देश हैं। यहां कई ऐसे मंदिर हैं, जो सैकड़ों वर्षों पुराने है, उन्हीं में से एक है भगवान राम का ये मंदिर।
महाराष्ट्र के नागपुर से करीबन 40 किलोमीटर दूर स्थित रामटेक मंदिर प्रभु राम का अद्भुत मंदिर है। इस मंदिर को लेकर ऐसी कहानी है कि भगवान राम ने वनवास के दौरान इस स्थान पर चार महीने तक माता सीता और भगवान लक्ष्मण के साथ समय बिताया था। इसके अलावा माता सीता ने यहां पहली रसोई भी बनाई थी, उन्होंने खाना बनाने के बाद स्थानीय ऋषियों को भोजन कराया था। इस बात का वर्णन पद्मपुराण में भी किया गया है।
राम नवमी के विशेष अवसर पर इस मंदिर के आसपास मेला लगता है, जिसमें दूर-दूर से लोग शामिल होने के लिए आते हैं। इसकी विशेषताओं की बात करें तो यह मन्दिर सिर्फ़ पत्थरों से बना है, जो एक दूसरे के ऊपर रखे हुए हैं। सैकड़ों वर्ष पुराना यह मंदिर जस का तस है, स्थानीय लोग इसके पीछे भगवान राम की कृपा बताते हैं। आइए जानते हैं इस मंदिर से जुड़ी कुछ ख़ास बातें।
मंदिर कम किला है रामटेक
एक छोटी पहाड़ी पर बने रामटेक मंदिर को गढ़ मंदिर भी कहा जाता है। इसके अलावा इसे सिंदूर गिरि भी कहते हैं। यह देखने में मंदिर कम क़िला अधिक लगता है, विशेष बात है कि इसके पूरब की ओर सुरनदी बहती है। रामटेक मंदिर का निर्माण राजा रघु खोंले ने एक क़िले के रूप में करवाया था। मंदिर के परिसर में एक तालाब भी है, जिसे लेकर ऐसी मान्यताएं है कि इस तालाब में पानी कभी कम या ज़्यादा नहीं होगा। हमेशा सामान्य जल स्तर होने की वजह से लोग काफ़ी हैरान होते हैं। यही नहीं ऐसा माना जाता है कि जब भी बिजली चमकती है तो मंदिर के शिखर पर ज्योति प्रकाशित होती है, जिसमें भगवान राम का अक्स दिखाई देता है।
भगवान राम से मिले थे ऋषि अगत्स्य
रामटेक ही वह स्थान है, जहां भगवान राम और ऋषि अगत्स्य मिले थे। ऋषि अगत्स्य ने ना सिर्फ़ भगवान राम
को शस्त्रों का ज्ञान दिया था बल्कि उन्हें ब्रह्मास्त्र भी प्रदान किया।
जब श्रीराम ने इस स्थान पर हर जगह हड्डियों का ढेर देखा तो उन्होंने इस
बारे में अगत्स्या से प्रश्न किया। तब उन्होंने बताया कि यह उन ऋषियों की
हड्डियां हैं, जो यहां पूजा करते थे। यज्ञ और पूजा करते समय राक्षस विघ्न
डालते थे, जिसे जानने के बाद श्रीराम ने प्रतिज्ञा ली थी, कि वह उनका विनाश
करेंगे। यही नहीं ऋषि अगत्स्य ने रावण के अत्याचारों के बारे में भी भगवान
राम को यहीं बताया था। उनके दिए गए ब्रह्मास्त्र के ज़रिए ही भगवान राम
रावण का वध कर पाए थे।
इस जगह पर कालिदास ने लिखी थी मेघदूत
![]()
रामटेक ही वह स्थान है, जहां पर महाकवि कालिदास ने महाकाव्य मेघदूत लिखी थी। इसलिए इस जगह को रामगिरि भी कहा जाता है, हालांकि कालांतर में इसका नाम रामटेक हो गया। वहीं त्रेता युग में रामटेक में सिर्फ़ एक पहाड़ हुआ करता था। आज के दौर में यह मंदिर भगवान राम के प्रसिद्ध मंदिरों में से एक है। यह ख़ूबसूरत जगह शहर के शोरगुल से अलग श्रद्धालुओं को सुकुन प्रदान करती है।
अगर आपको यह आर्टिकल अच्छा लगा हो तो इसे शेयर जरूर करें व इसी तरह के अन्य लेख पढ़ने के लिए जुड़ी रहें आपकी अपनी वेबसाइट हरजिन्दगी के साथ
श्रीराम मंदिर रामटेक | Discover Maharashtra

श्रीराम मंदिर रामटेक…
रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील पवित्र व निसर्गरम्य स्थान आहे. हे नागपूरच्या ईशान्येस रस्त्याने ५५ कि. मी. अंतरावर आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावरील मनसर या ठिकाणाहून येथे रस्ता जातो. नागपूरशी हे लोहमार्गानेही जोडलेले असून अंबागड टेकड्यांच्या पायथ्याशी आहे.
रामटेक टेकडीवरील श्रीराम मंदिर :
रामटेक या १५२ मी. उंचीवर असलेल्या टेकडीवर चौदाव्या शतकातील बरीच मंदिरे आहेत. या रामटेक टेकाडीची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिकरीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे. या टेकडीला चारी बाजूंनी कोट असून त्याला अनुक्रमे वराह, भैरव, सिंगपूर आणि गोकुळ असे चार दरवाजे आहेत. नागपूरचा रघूजी पहिला याच्या हातून देवळाच्या बाहेरच्या मजबूत तटबंदीचे काम झाले. मुख्य दरवाजा वराह दरवाजा. कारण लगेच आत वराह या विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्यापलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा या रेषेतील दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो. आत राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच आहे व त्यासमोर राम व सीतेचे मोठे देऊळ उभे दिसते. मुख्य वास्तूच्या सभोवार इतर अनेक देवतांची मंदिरे आहेत.
नागपूरची खास वास्तुशैली रामटेकलाही दिसून येते. उत्तर व पूर्वेकडील भिंती, शिखरे, उपशिखरे, कलश व खांबाच्या बांधणीचे बारकावे य वास्तूत दृग्गोचर होतात. छोट्या छत्र्या, उलट्या कमलकळीची नक्षी, जाळीदार खिडक्या, सज्जे व उथळ देवळ्या यांमुळे देवळावर उजेड व सावल्यांचा नयनमनोहर खेळ दिसतो. शिखरे भूमिज प्रकारची आहेत.
हे मंदिर सुमारे ७०० वर्षे जुने आहे. भक्तगण प्रथम येथील धूम्रेश्वर महादेवाचे दर्शन घेऊनच श्रीराम मंदिरात दर्शनास जातात.
या राममंदिरात राम-सीता यांच्या काळ्या दगडातील, वनवासी वेषातील रम्य मूर्ती आहेत. त्या दुधाळे तलावात मिळाल्याचे म्हटले जाते. या मंदिरासमोरच लक्ष्मणाचेही मंदिर असून, गोकुळ दरवाजा व लक्ष्णण मंदिर यांवरील कोरीव काम विशेष लक्षणीय आहे. यांव्यतिरिक्त अन्य काही मंदिरेही आवारात आहेत.
मंदिरासमोरच एक कुंड असून, ते सीतेची न्हाणी म्हणून ओळखले जाते. टेकडीच्या पायथ्याशी एक जुने कल्की अवताराचे (दशावतारातील दहावा अवतार) मंदिर व मध्ययुगीन नागर शैलीत बांधलेली काही जैन मंदिरे आहेत.
राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.
संस्कृतच्या अभ्यासाकरिता स्थापन करण्यात आलेले कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे मुख्यालय येथे आहे.
रामटेकमध्ये माणिकताल व मथुरासागर अशा दोन बागा आणि २७ तलाव असून त्यांपैकी अंबाला तलाव सर्वांत मोठा आहे. या तलावाच्या काठावर आधुनिक पद्धतीने बांधलेली अनेक प्रेक्षणीय देवालये असून सकाळच्या प्रहरी या देवालयांवर सूर्यकिरणे पडून चमकू लागली म्हणजे तलाव व देवालये यांचे एकंदर दृश्य अतिशय मनोहारी बनते. या मंदिरांमध्ये एक अप्रतिम सूर्य मंदिरही आहे. अंबाला तलावावर एकूण आठ घाट बांधण्यात आले असून त्यांना अष्टतीर्थांची नावे देण्यात आली आहेत.
अख्यायिका :
येथे नरसिंहाने हिरण्यकश्यपूला मारले अशी अख्यायिका आहे.
सण व उत्सव :
रामटेक श्रीराम मंदिर येथे रामनवमी व त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी मोठ्या जत्रा भरतात. या मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो. ही त्रिपुरारी पौर्णिमेची व रामनवमीची जत्रा १२ व्या शतकातही ही भरत असे असा उल्लेख लीळा चरित्र ग्रंथात आला आहे. रामाच्या देवळावर त्रिपूर जाळण्याची पद्धत त्रिपुरासुराच्या शंकराने केलेल्या संहाराची निदर्शक आहे. या जत्रेत भांडी, खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीस असतात.
सितामाता रसोई घर गडमंदिर रामटेक :
सितामाता रसोई घर गडमंदिर रामटेक येथे मंदिर संस्थानामार्फत दर शनिवारी आणि रविवारी उन्हाळ्यात सकाळी ९:३० ते दुपारी १२.३० पर्यंत व इतर ऋतूंमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपावेतो निशुल्लक भोजन देण्यात येते.
एकूण मराठी देवळांची बांधणी व वास्तुकला यांवर येथील हवापाणी, डोंगरदऱ्या व धार्मिक वापर यांचा परिणाम येथे दिसून येतो. विशेषतः वारकरी सांप्रदायाचा मोठा पगडाच या वास्तुकलेवर आहे. भक्तिमार्गामुळे अनेक जत्रा व यात्रांच्या प्रथा आजतागायत रामटेकसह उभ्या महाराष्ट्रात चालू आहेत.
रामटेक या नावाचा इतिहास व या मंदिराला व टेकडीला दिली गेलेली ईतर नावे :
रामटेक म्हणजे ‘रामाची टेकडी’; रामाने वनवासकाळात या टेकडीवर काही काळ विश्रांती घेतली म्हणून यास रामटेक नाव पडले, असेही म्हटले जाते. या टेकडीवर विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला व त्याच्या रक्ताने येथील दगड तांबडे झाले म्हणून यास ‘सिंदुरगिरी’ असेही नाव पडले आहे. ‘रामगिरी’, ‘तपोगिरी’, ‘काशीचे महाद्वार’ असेही याचे उल्लेख आहेत. ‘सिंदुरगिरी’ व ‘तपोगिरी’ ही दोन्ही नावे येथील लक्ष्मण मंदिरावरील कोरलेल्या एका यादवकालीन शिलालेखात (तेरावे शतक) आढळतात.
रामटेकच्या दक्षिणेला वाकाटककालीन नगरधन चा किल्ला आहे.
रामटेकचा इतिहास :
इ.स.२५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता.सातवाहनांच्या कालात प्रवरपूर (सध्याचे मनसर) हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इ.स. ३५० मध्ये त्यांचा पडाव करून वाकाटकांनी सत्ता काबीज केली. त्याच काळात कालिदास झाले असा समज आहे. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे ‘मेघदूत’. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. सन १९७०-१९७१ मध्ये, रामटेक गडमंदिर परिसरात, महाराष्ट्र शासनाने ‘कालिदास स्मारकाची’ निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.या ठिकाणी दरवर्षी ‘कालिदास महोत्सव साजरा होत असतो. रामटेकच्या दक्षिणेला असलेला वाकाटककालीन नगरधन चा किल्ला हा वाकाटकांची राजधानी होता.
रामटेक तालुक्यात १८६७ साली नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. तीर्थक्षेत्राखेरीज आसमंतीय मँगॅनीजच्या खाणी यांमुळे रामटेकला विशेष महत्व आले आहे. येथील पानमळे प्रसिद्ध असून ही पाने पुण्या-मुंबईला निर्यात होतात. रामटेक जवळच तोतलाडोह हे धरण आहे.
येथील नयनरम्य सृष्टीसौंदर्य पाहून कविश्रेष्ठ कालिदासाला मेघदूतासारखे खंडकाव्य स्फुरले, तर कवी अनिलांनी येथील त्रिविक्रम वामनाचे मंदिर पाहून भग्नमूर्ति हेखंडकाव्य लिहिले.
https://www.discovermh.com/shriram-temple-ramtek/
लहान टेकडीवर आहे रामटेक मंदिर; जेथे भगवान राम वनवासात राहिले
महाराष्ट्रातील नागपूरपासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर असलेले रामटेक मंदिर हे भगवान राम यांचे एक अद्भुत मंदिर आहे. या मंदिराविषयी अशी कहाणी आहे की भगवान राम यांनी वनवासात माता सीता आणि भगवान लक्ष्मण यांच्यासमवेत या ठिकाणी चार महिने घालवले होते. याशिवाय, माता सितेने येथे प्रथम स्वयंपाकघरही बनवले होते, स्वयंपाक केल्यानंतर तिने स्थानिक ऋषींना भोजन केले. पद्मपुराणातही या गोष्टीचा उल्लेख आहे. या मंदिराच्या आजूबाजूला रामा नवमीच्या खास उत्सवाच्या निमित्ताने जत्रेचे आयोजन केले जाते, ज्यात दूरदूरच्या ठिकाणाहून लोक उपस्थित राहतात. त्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलताना हे मंदिर केवळ दगडांनी बनलेले आहे, जे एकमेकांच्या वर ठेवलेले आहेत. शेकडो वर्ष जुने हे मंदिर जशी आहे तशीच राहते, स्थानिक लोक त्यामागे भगवान रामची कृपा सांगतात. चला या मंदिराशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.
रामटेक हा एक किल्लाच
छोट्या टेकडीवर बांधलेले रामटेक मंदिर गढ मंदिर म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय त्याला सिंदूर गिरी असेही म्हणतात. हे पाहता मंदिर कमी तटबंदीचे दिसते. विशेषत: सूरानाडी पूर्वेकडे वाहत आहे. रामटेक मंदिर किल्ला म्हणून राजा रघु खोन्ले यांनी बांधले होते. मंदिराच्या आवारात एक तलाव आहे; ज्यावरून असा विश्वास आहे की या तलावामध्ये कधीही कमी-जास्त पाणी येणार नाही. नेहमीच्या पाण्याची पातळी नेहमीच राहिल्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. एवढेच नव्हे तर जेव्हा जेव्हा विजा चमकतात तेव्हा मंदिराच्या शिखरावर एक दिवा प्रकाशित केला जातो, ज्यामध्ये भगवान रामची प्रतिमा दिसते.
संत अगासत्य भगवान रामला भेटले
रामटेक हे असे स्थान आहे जिथे भगवान राम आणि ऋषी आगतस्य भेटले होते. संत अगतस्याने भगवान राम यांना शस्त्रांचे ज्ञानच दिले नाही तर त्यांना ब्रह्मास्त्रही दिले. जेव्हा श्री रामांना या ठिकाणी सर्वत्र हाडांचे ढीग दिसले तेव्हा त्यांनी अगस्त्याबद्दल असा प्रश्न केला. मग त्यांनी सांगितले की येथे उपासना करणारे ऋषीमुनींची हाडे आहेत. यज्ञ आणि पूजा करीत असतांना, श्रीरामांनी त्यांना नष्ट करण्याचा व्रत केला हे समजल्यावर राक्षस अस्वस्थ झाले. इतकेच नव्हे तर ऋषी अगासत्य यांनी भगवान रामाला येथे रावणातील अत्याचाराविषयीही सांगितले. भगवान रामने आपल्या दिलेल्या ब्रह्मास्त्रातूनच रावणांचा वध केला.
कालिदास यांनी या ठिकाणी मेघदूत लिहिले
महाटेवी कालिदास यांनी मेघदूत हे महाकाव्य लिहिले आहे. म्हणूनच, या जागेला रामगिरी देखील म्हटले जाते, परंतु नंतर त्याचे नाव रामटेक असे ठेवले गेले. त्याच वेळी त्रेता युगात रामटेकमध्ये फक्त एक डोंगर असायचा. आज हे मंदिर भगवान रामाच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. शहराच्या आवाजाशिवाय या सुंदर जागेमुळे भाविकांना दिलासा मिळतो.
https://www.esakal.com/tourism/marathi-news-ramtek-temple-nice-place-nagpur-district
Ramtek (रामटेक) – Mahanubhav Darshan

रामटेक, ता.काटोल जि.नागपूर
रामटेक येथील 9 उपलब्ध स्थाने एकाच परिसरात गावाच्या पूर्वेकडे रामटेक डोंगरावर भोगराम नावाने ओळखले जातात. उर्वरित स्थाने देवेतेच्या मंदिराच्या चौकात आहेत येथे पूजारी राहतात ते स्थाने दाखवतात.

जाण्याचा मार्ग :
मनसरहून आग्नेयेस रामटेक 7 कि. मी. आहे. नागपूर ते रामटेक (मनसर मार्गे) 47 कि.मी. आहे नागपूरहून रामटेकला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वेगाडी आहे. नागपूर व भंडारारोड मधील कन्हान जंक्शनहून रामटेकला जाता येते. रामटेक शहरात निवासाची सोय आहे. व आपले आश्रम सुद्धा आहेत.
स्थानाची माहिती :
1. अवस्थान स्थान :
रामटेक शहराच्या ईशान्येस डोंगरावर किल्ल्यामध्ये पूर्वेच्या दक्षिणाभिमुख दरवाजाच्या आतील वराह मूर्तीच्या पश्चिमेस प्राचीन भोगरामाचे पूर्वाभिमुख देऊळ आहे. त्या देवळात आत जाताना डाव्या हाताला है स्थान आहे. स्थानाचा पूर्व-पश्चिम, उत्तराभिमुख ओटा आहे.
त्रेतायुगात श्रीराम रामटेक च्या मार्गाने पंचवटी ला गेले होते, म्हणून रामटेक हिंदूंसाठी तीर्थक्षेत्र आहे, त्याच गड मंदिर (राम मंदिर) च्या गड किल्यात आपले भोगराम मंदिर आहे. गड मंदिरा साठी ऑटोरिक्षा रामटेक शहरातून मिळतात.
लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे एकांकात येथे दहा महिने वास्तव्य होते. (स्था.पो.)
येथील इतर लीळा : 1. भोगरामाचा पुजारी येथे प्रथम सर्वज्ञांची पूजा करीत असे. मग आत जाऊन देवतेची पूजा करीत असे (पू. ली. 44)
2. सर्वज्ञांची व बोणेबाइयांची भेट येथेच झाली. (पू.ली. 44)
3. याच ओट्यावर बसल्याने ब्राह्मणाला स्थिती झाली होती. (पू. ली. 45)
Google Map Location Link 👈 (किल्क करा)

गड मंदिराच्या पायऱ्या चढताना दिसणारे भोगराम मंदिर 
भोगराम मंदिर 
भोगराम मंदिर सभामंडप 
सभामंडप 
अवस्थान स्थान 
अवस्थान स्थान 
अवस्थान स्थान 
अवस्थान स्थान
2. संदी स्थान :
भोगरामाच्या देवळाच्या उत्तर बाजूस भैरवाचे देऊळ आहे. या दोन देवळांमधील संदी संपूर्ण नमस्कारी आहे. ही नमस्कारी जागा वर्षभर बंद असते, फक्त कार्तिक पौर्णिमेच्या यात्रेच्या दिवशी खोलण्यात येते.
लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू दररोज या संदीतून बोणेबाइयांच्या गुंफेकडेजात असत. (स्था. पो.)
Google Map Location Link 👈 (किल्क करा)

प्राचीन भोगराम देवता मूर्ती 
प्राचीन भैरव देवता मूर्ती 
भोगराम व भैरव मंदिराच्या मधून जाणारी निमुळती जागा म्हणजे संधी 
संधी स्थान 
संधी स्थान 
संधी स्थानाच्या मागचे भाग
3. परिश्रया बीजे करणे स्थान :
हे स्थान देवळाच्या पूर्वेस आहे.
लीळा : पूर्वी जगतीची खिडकी पूर्व बाजूस होती. त्या खिडकीतून सर्वज्ञ परिश्रयाला जात असत. (स्था. पो.)
Google Map Location Link 👈 (किल्क करा)

4. लघुपरिश्रय स्थान :
हे स्थान परिश्रया बीजे करणे स्थानाच्या उत्तरेस आहे. (स्था. पो.)
Google Map Location Link 👈 (किल्क करा)

उजवीकडले बीजे करणे स्थान, डावीकडले लघु परिश्रय स्थान
5, 6, 7, 8, 9. ही पाच स्थाने देवळाच्या पाठीमागे आहेत :
ही स्थाने बोणेबाइयांच्या गुंफेशी संबंधित असलेली आरोगणा व आसन स्थाने आहेत. परंतु कोणत्या लीळेचे कोणते स्थान आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)

मंदिराच्या मागचे 5 स्थान 
मंदिराच्या मागचे 5 स्थान 
मंदिराच्या मागचे 5 स्थान 


बोनेबाई दृतीय स्थान 
बोनेबाई प्रथम स्थान 
मंदिराच्या मागचे 5 स्थान
अनुपलब्ध स्थाने :
खालीलप्रमाणे दिलेली स्थाने देवेतेच्या मंदिरातील चौकातले आहेत. तिथे स्थानाचे ओटे नसल्यामुळे ते केव्हाही उपलब्ध होऊ शकत नाही, ज्याला माहित आहे त्याला नेल्याशिवाय नमस करता येत नाही.
1. रामाच्या देवळातील आसन.
हे स्थान येथील मुख्य प्राचीन गड मंदिर अर्थात राम मंदिराच्या चौकात आहे, चौक नमस्कारी आहे, हिंदूंचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे अन्य भाविकांची गर्दी असते, म्हणून पुजारी चौकापर्यंत जाऊ देत नाही.
2. लक्ष्मणाच्या देवळातील आसन.
हे स्थान येथील मुख्य प्राचीन लक्ष्मण मंदिराच्या चौकात आहे, चौक नमस्कारी आहे, हिंदूंचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे अन्य भाविकांची गर्दी असते, म्हणून पुजारी चौकापर्यंत जाऊ देत नाही.
राम आणि लक्ष्मण मंदिर एकाच परिसरात आहेत. (गड मंदिर)
Google Map Location Link 👈 (किल्क करा)

प्राचीन गड मंदिर/श्रीराम मंदिर 
राम मंदिराच्या चौकातील नमस्कारी जागा, (गोल चौकटीतील) 
प्राचीन लक्ष्मण मंदिर
3. सेंदूरबावी आरोगणा.

हे स्थान नमस करता येते, येथे आता ओटे बांधण्यात आले आहे, सेंदूर बावली म्हणजे एक मोठे कुंड आहे, हे कुंड आपल्या भोगराम मंदिरापासून पुर्वेकेडे 200 मीटरवर आहे, मुख्य पार्किंग जवळून सुद्धा जाता येते.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)

सेंदूर बावी मधील आरोगणा स्थानाचे ओटे 
सेंदूर बावी मधील आरोगणा स्थानाचे ओटे 
सेंदूर बावी मधील आरोगणा स्थानाचे ओटे
4. कापूरबावी आरोगणा.

कापुरबावीच्या तलावाकाठी चामुंडेश्वरी देवी मंदिर आहे कापुरबावी तलाव सेंदूरबावी वरून उत्तरेस पायी 1 कि.मी. आहे, स्थान अनुपलब्ध आहे. येथील स्थानाची जागा आम्हाला सापडली नाही, जर तुम्हाला माहित असेल तर खाली ईमेल बॉक्स माहिती द्यावी.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)

5. अंबाळा तळ्याच्या पूर्व पाळीचे आरोगणा.
6. अंबाळा तळ्याच्या पश्चिम पाळी प्राचीन लिंगाचा देऊळी आसन.
7. अंबाळा तळ्याच्या दक्षिण पाळी आसन.

गड मंदिराकडे डोंगरावर जाताना खोल दरीत प्राचीन अंबाळा तलाव दिसतो, त्या तलावाच्या काठावर कधी-कधी आमचे सर्वज्ञ आरोगणा करीत असत, तिथे शिव मंदिराच्या चौकाची नमस्कारी जागा व काठावरील नमस्कारी जागा आम्हाला सापडली नाही, जर तुम्हाला माहित असेल तर खाली ईमेल बॉक्स माहिती द्यावी.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)

अंबाळा तळ्याच्या काठावरील प्राचीन मंदिरे 
अंबाळा तळ्याच्या काठावरील प्राचीन मंदिरे
8. नरसिंही आसन.
9. हनुमंताच्या देवळातील आसन
10. गुप्त रामी आसन

ही तिन्ही मंदिरे गड किल्याजवळ व पार्किंग जवळ आहेत, स्थाने अनुपलब्ध आहेत, नमस्कारी जागा आम्हाला सापडली नाही, जर तुम्हाला माहित असेल तर खाली ईमेल बॉक्स माहिती द्यावी.
गुप्त राम मंदिर गडाच्या पायऱ्या चढताना रस्त्यात पडतो, इथेच कुठेतरी गुप्त भैरव मंदिर असावे.
Google Map Location Link 👈 (किल्क करा) (नरसिंह मंदिर)
Google Map Location Link 👈 (किल्क करा) (हनुमान मंदिर)
Google Map Location Link 👈 (किल्क करा) (गुप्त राम मंदिर)

प्राचीन नरसिंह मंदिर 
प्राचीन नरसिंह मंदिर 
प्राचीन हनुमान मंदिर 
प्राचीन गुप्त राम मंदिर 
प्राचीन गुप्त राम मंदिर
11. गुप्त भैरवी आसन
12. धम्मऋषीच्या देऊळी आसन
13. सीतेच्या न्हाणीच्या उत्तरेचे आसन

धम्म ऋषीच्या मंदिर 
सीता नाहणी
14. परिश्रय
रामटेकची एकूण स्थाने : 23
- Purvardha Charitra Lila – 44
- Ramtek : भोगरामीं अवस्थान :।।: (रामटेक)
- सर्वज्ञें म्हणितलेः ‘‘बाइः एथिचेया नामापासौनि वेधु कां स्थानापासौनि वेधुः’’ गोसावी भोगरामासि बिजें केलें: भोगरामाचिये पटिशाळे दक्षिणीली भितीसि पूर्वपसिम ओटाः तेथ अवस्थान जालें: तेथीचा बडुवा आधीं गोसावियांसि धूपार्ति करीः मग भोगरामासि करीः ऐसें केतुले एक दी राज्य केलें :।।: (हे गोष्टि गोसावी हिवरळीये लुखदेवोबावरूनि सांघितलीः ब्राम्हणा स्तीति मनसिळेवेर्हीं :।।:)
- Purvardha Charitra Lila – 44
- Ramtek : बोणेबाइयां भेटिः सेवा स्वीकारू :।।: (रामटेक)
- गोसावियांसि खडकुलीए अवस्थानः एकु दी भोगरामीचीया बाइया त्रियंबकासि गेलिया होतियाः त्रियंबकौनि मागोमतिया आलीयाः सावंखेडां ब्राम्हणां एकाचीए वोसरीए बिढार घेतलें: मग निद्रा करीतां समयी तेहीं ब्राम्हणीं पुसिलें: ‘‘आइः तुम्हीं काइ श्रीचांगदेवराऊळां गोसावियांचिया?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘नाः श्रीचांगदेवराऊळ तें कोण?’’ ब्राम्हणीं म्हणितलें: ‘‘ना आइः खडकुलीएसि एक पुरूख असतिः काइ सांघों तयाचें लावण्यः सौंदर्यः तयाचे तुम्हीं दरीसन घेया होः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ म्हणौनि निजैलियाः मग उदेयाचि उठौनि गंगेसि आलीयाः तेथुनि गोसावियांचियां दरीसना आलीयाः गोसावियांतें देखिलें: दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलीयाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘यें एथीचीं यजमानें मां:’’ गोसावी तयासि बैसलेयां क्षेमालिंगन दिधलें: तिया गोसावियांपुढां बैसलीयाः मग बाइसीं पुसिलें: ‘बाबाः यजमानें म्हणिजेति काइ?’’ यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें पूर्वि निरालंबी एकाकी विचरत विचरत सिंदुरगिरीसि भोगरामा गेलें होतें:’’ गोसावी भोगरामासि बिजें केलें: नगरांतु पाणिपात्रसि बिजें करीतिः मग अंबाळेयाचिये पूर्विली पाळीसि आरोगणा होएः कदाचित कापूरवावीसि आरोगणा होएः कदाचित सेंदुरवावीसि आरोगणा होएः भोगरामी ओटयावरि पहूड होएः उदेयासि गोसावी विहरणा बिजें करीतिः एकाधा दिसीं लक्ष्मणाचा देउळीं आसन होएः कहीं हनुमंताचां देउळी आसन होएः एकाधा दीं सीतेचीए न्हाणीए बिजें करीः उत्तरीलीकडें आसनः कदाचित अंबाळेया बिजें करीतिः तेथ पसिमीली पाळी लिंगाचीए देउळीए आसन होएः कहीं अंबाळेयाचीए दक्षिणीली पाळी पसिमीलीकडें आसन होएः एकाधा दिसीं नरसिंही आसन होएः एकाधा दिसीं धम ऋषीचा देउळीं आसन होएः एकाधा दीं गुप्तरामीं आसन होएः एकाधा दीं गुप्तबहीरवीं आसन होएः प्रतिदेउळीं: मढमंडपीः पटिशाळाः चैबारां: बावीपोखरणीः तळीं तळौलियाः ऐसीं अवघीं अवलोकीतिः आसन होएः मढावरि पांजरीभवतें अवलोकीतिः एकु दी गोसावी सोंडिएवरि चरणचारी उभे असतिः तवं बोणेबाइया देवतेसि दंडवता आलीयाः तिया गोसावियांतें देखिलें: आणि गोसावियांचिकडें आलीयाः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीयाः मग गोसावियांतें पुसिलें: ‘‘बा आपणेयां नांव काइ?’’ गोसावियांसि मौनाची प्रवृत्तिः गोसावी उगेचिः तिया भोगरामासि पूजा करावया आलीया होतियाः तें पूजा तिहीं गोसावियांचा ठाइ केलीः मग भोगरामासि केलीः मग गेलियाः तवं बडवे आले गोसावियांतें देखिलें: सौंदर्ये देखौनि वेधलेः श्रीचरणां लागलेः आणि विनविलें: ‘जी मीं गोसावियांची पूजा करीनः’ गोसावी मानिलें: मग चरणक्षाळण केलें: श्रीमुख प्रक्षाळण केलें: गुळळा जालाः चंदनाचा टिळा केलाः पुष्पाची पूजा केलीः ‘जय जय’ शब्दीं धूपार्ति मंगळार्ति केलीः पाठी बडवीं देवतेसी पूजा केलीः मग गोसावी रामाचेया देउळासी विहरणा बिजें केलें: एकु दीं भोगरामीचेनि राणेनि बोणेबाइयातें म्हणितलें: ‘‘आवो आवो बोणेबाइः इश्वरपुरूख एक आले असतिः तयासि तुम्हीं प्रतदिनीं दोही सांजी आरोगणा देयावीः’’ बोणेबाइया म्हणितलें: ‘‘ना हो कां:’’ म्हणौनि बाइया भोगरामासि आलीयाः गोसावियांसी ओटयावरि आसन असेः तेही दंडवत केलें आणि मागुते पुसिलें: ‘‘बा आपणेयां नांव काइ?’’ तवं गोसावियांसि मौनची प्रवृत्ति म्हणौनि उगेचिः मग रामासि गेलियाः देवतेसि नमस्कारू केलाः माघौतिया आलीयाः तेंहीचि म्हणितलें: ‘‘बा आपणेयां नांव काइ नग्नदेव?’’ गोसावी श्रीमुकुटें मानिलें: गोसावियांतें विनविलेः ‘‘बा नग्नदेव होः आमचेया गुंफे बिजें करावेः’’ गोसावियांसि बिजें करावाची प्रवृत्तिः गोसावी विनंती स्वीकरिलीः तयाचीये गुंफैसि बीजें केलें: दोहीं देउळांचिये संदीमागां अवकाशीं तयाची गुंफाः तयाची वाटा बिजें केलें: गोसावियांसि आसन रचीलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: आरोगणेचे विनविलें: गोसावी मानिलें: पाणीभाताची आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग पुढति विनविलें: ‘‘बा नग्नदेव हो जवं एथ असाल तवं एथ यावें होः आम्हीं उपहारू देउनिः उदेया जैसें असैल तैसें आरोगिजे बा विळीचां भिक्षा करौनि येउनिः मां जैसे असैल तैसें आरोगिजो बा’’ गोसावी मानिलें: मग तियें दिउनी गुंफेसि प्रतिदीनीं संदीहुनी बिजें करीतिः गोसावियांसि तेथ आरोगणा होएः कदाचित पाणिपात्रसि बिजें करीतिं: रामाचां देउळीं ओटयावरि पहूड होएः ऐसीं गोसावियांची थोरी प्रसिद्धीः तेयांचे बडुवे प्रतिदीनी देवतेसि पूजा करावेया येतिः तें आधी गोसावियांचा ठाइं करीतिः गोसावियांचें चरणक्षाळण करीतिः पूजा करीतिः दंडवते करीतिः श्रीचरणां लागतिः बाइसीं पुसिलें: ‘बाबाः तें कैसी पूजा बांधति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सेवतेयां फुलांचे झळंबुकेः मुगुटीं कळेयांचा फराः मोगरे कळीयांचे बाहुसरः हातसरः अष्टांगावरि फुले ठेवतिः तुळसी वातीः मग धुपार्ति मंगळार्ति करीतिः साष्टांग दंडवतें घालीतिः श्रीचरणां लागतिः पाठीं देवतेसि पूजा करीतिः ऐसें प्रतिदीनी करीतिः’’ :।।: (हें गोष्टि गोसावी खडकुलीए रामीचेया बाइयांउपरि बाइसांप्रति सांघितलीः।।:)
- Purvardha Charitra Lila – 44
- Ramtek : गुप्तबहीरवीं अवस्थान :।।: (रामटेक)
- मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एकु दीं एणें गुप्तबहीरवीं विहरणा बिजें केलें: तेथ त्रिरात्र अवस्थान जालें: मागुते स्वस्थाना बिजें केलें: मग केतुलेयां एकां दिसां मनसिळेसि बिजें केलें:’’:।।:
या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
| रामटेक (Ramtek) | किल्ल्याची ऊंची : 2000 | ||
| किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: रामगिरी | ||
| जिल्हा : नागपूर | श्रेणी : मध्यम | ||
| नागपूर शहरापासून ५० किमी
अंतरावर रामटेक व नगरधन हे २ सुंदर किल्ले आहेत. त्यापैकी रामटेक किल्ला व
रामटेकच्या पायथ्याशी असलेले अंबाला सरोवर पुराण काळापासून धर्मक्षेत्र
म्हणून प्रसिध्द आहे. रामगिरी प्राचीन काळापासून धर्मस्थान होते. रामाने या
ठिकाणी विश्रांती घेतली होती. बौध्द तत्वज्ञ नागार्जून यांनी काही काळ
तेथे वास्तव्य केले. कालिदासांना त्यांचे मेघदूत हे काव्य याच डोंगरावर
सुचले अशी आख्यायिका आहे. श्री चक्रधर स्वामी यांनी या गडावर धार्मिक उपदेश
केला. संत तुकडोजी महाराज यांनी या गडावर ध्यान साधना केली. रघुजी भोसले
यांनी गडावरील व अंबाला सरोवर परीसरातील मंदिरांचा जिर्णोध्दार केला. पुराण काळापासून पेशव्यांच्या पर्यंत हा किल्ला नांदता होता. आजही त्यावरील राममंदिरामुळे तिर्थस्थान म्हणून हा गड प्रसिध्द आहे. रामटेकच्या पायथ्याशी असलेले अंबाला सरोवर व त्याभोवती असलेली पूरातन मंदिरेही पाहाण्या सारखी आहेत.रामटेक किल्ल्याची डागडूजी पूरातत्व खात्याने इ.स. २०१२ मध्ये केल्यामुळे हा गड आपले पूर्वीचे वैभव दाखवत आजही उभा आहे.
|
|||
|
|||
| इतिहास : | |||
| पुराणातल्या कथेप्रमाणे अगस्ती
ऋषींचा आश्रम रामगिरी पर्वताच्या परीसरात होता. त्यांच्या धार्मिक विधीत व
यज्ञ -यागात असूर बाधा आणीत असत. त्यांचा वध करण्याची रामाने शपथ घेतली
होती. (स्थानिक भाषेत शपथ म्हणजे "टेक") .त्याप्रमाणे रामाने असूरांचा वध
करून जवळच्याच डोंगरावर विश्रांती घेतली. रामाने घेतलेली शपथ म्हणून
"रामटेक" असे या स्थानाचे नाव पडले. आज या डोंगरावर राम- सीता व लक्ष्मणाचे
मंदिर आहे. मौर्य, शृंग, सातवाहन, क्षत्रप, मुंड या राजसत्तां नंतर आलेल्या वाकाटाक घराण्याने (इ.स.२७० ते इ.स.५००) विदर्भावर राज्य केले. वाकटाकांच्या नंदिवर्धन, प्रवरपूर व वत्सगुल्म ह्या ३ राजधान्या होत्या. त्यापैकी नंदिवर्धन उर्फ नगरधन ही वाकटाकांची आद्य राजधानी रामटेक पासून ७ किमीवर होती. त्यामुळे वाकटाकांच्या काळात रामटेक किल्ला महत्वाचा किल्ला होता. विंध्यशक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता. हे घराणे धर्माभिमानी व सहिष्णु होते. याच राजघराण्यातील रुद्रसेन व्दितिय याची पत्नी प्रभावती ही चंद्रगुप्त व्दितिय कन्या होती. प्रभावती ही धार्मिक होती. तिने व तिच्या पुत्रांनी रामगिरीवर नरसिंह, वराह, त्रिविक्रम, गुप्तराम इ. मंदिरे उभारली. नरसिंह मंदिरात असलेल्या ब्राम्ही शिलालेखात याचा उल्लेख आहे.रघुजी भोसले यांनी गडावरील व अंबाला सरोवर परीसरातील मंदिरांचा जिर्णोध्दार केला. |
|||
| पहाण्याची ठिकाणे : | |||
| रामटेक
किल्ल्यावर थेट वहानाने जाता येते. वहान तळावर उतरल्यावर पायर्या चढून
किल्ल्यात न जाता रस्त्याने पुढे गेल्यावर रस्त्या लगत उजव्या बाजूला एक
मोठी बारव दिसते. तिला सिंदूर बावडी या नावाने ओळाखले जाते. बारव पाहून
पायर्यांच्या वाटेने किल्ल्यात जातांना जागोजागी पूजा साहित्याचे,
खाण्यापिण्याची दुकाने आहेत. किल्ल्याचे पश्चिमाभिमूख प्रवेशव्दार १२ फूट
उंच आहे. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूला महानुभव पंथाचे भोगाराम
मंदिर आहे. डाव्या बाजूला वराहचे मंदिर आहे. थोडे पुढे गेल्यावर उजव्या
बाजूला गावात उतरण्यासाठी पायर्या आहेत. किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार
पूर्वाभिमूख असून आतल्या बाजूस देवड्या आहेत. तिसरा दरवाजा दक्षिणाभिमूख
असून त्यावर नगारखाना आहे. या प्रवेशव्दारावर चढून जाण्यासाठी जिना आहे. या
जिन्याने दरवाजाच्या वरचा बाजूस जाऊन दरवाजा ओलांडून डाव्या बाजूच्या
बुरुजावर जावे. या बुरुजावर झेंडा लावलेला आहे. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग
असून त्यावरून संपूर्ण किल्ला व खालचे रामटेक गाव यांचे विहंगम दृश्य
दिसते. तसेच नगरधन किल्ल्याचेही येथून दर्शन होते. किल्ल्याच्या तिसर्या प्रवेशव्दारच्या बाहेर उजव्या बाजूला एक तोफ ठेवलेली आहे. प्रवेशव्दारच्या आत मंदिर संकुल आहे. या संकूलात जाण्यासाठी एका गोपूरातून जावे लागते. हेमाडपंथी रचना असलेल्या या गोपूरावर शिल्प कोरलेली आहेत. गोपूराचतून आत गेल्यावर डाव्या बाजूस दशरथ मंदिर आहे. त्याच्या व्दारपट्टीवर शिल्प कोरलेली आहेत. दशरथ मंदिरामागे पाण्याचा मोठा बांधीव तलाव आहे. या तलावावर एक घुमटी आहे. तलावात उतरण्यासाठी दोन बाजूस जिने आहेत. घुमटीच्या खालच्या बाजूला तलावाच्या भिंतीवर गंडभेरुंड कोरलेले आहेत. या तलावा मागिल बाजूला एक छोटा दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यावर चावीच्या आकाराची सुंदर विहिर आहे. विहिरीच्या डाव्या बाजूला असलेला जिन्याचा मार्ग रामटेक गावात उतरतो. हे पाहून आल्या मार्गाने परत मंदिर संकुलात आल्यावर प्रथम लक्ष्मणाचे मंदिर आहे. त्यामागे रामाचे मंदिर आहे. या दोनही मंदिरात नागपूरकर भोसल्यांनी वापरलेली शस्त्रे कपाटात ठेवलेली पाहायला मिळतात. राम मंदिराच्या मागे लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे. या मंदिराच्या गच्ची वरून रामटेक गाव व दूरचा परीसर दिसतो. या किल्ल्याला खालच्या बाजूस अजून एक तटबंदी असून, ती तटबंदी कालिदास स्मारकापासून सुरु होऊन संपूर्ण किल्ल्याला वेढा घालून वराह मंदिराच्या मागिल बाजूस असणार्या टेलिफोन टॉवर पर्यंत आहे. टेलिफोन टॉवर असलेला डोंगर हा छोट्याश्या खिंडीने रामटेक पासून वेगळा झालेला आहे. या डोंगरावर जाण्यासाठी रामटेकच्या वहानतळा जवळ येऊन रस्ता ओलांडून रामटेकच्या विरुध्द दिशेची पायवाट पकडावी, १० मिनिटात आपण डोंगरावर पोहोचतो. या ठिकाणी वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. ते पाहून परत वहानतळा जवळ यावे. येथे कालिदासाचे स्मारक आहे, ते पाहिल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. रामटेक किल्ल्याच्या खालच्या बाजूला अंबाळा तलाव आहे. या तलावाच्या किनार्यावर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. | |||
| पोहोचण्याच्या वाटा : | |||
| नागपूर ते रामटेक अंतर ५०
किमी आहे. नागपूर ते रामटेक एसटीची बससेवा आहे. रामटेक गावाला वळसा घालून
चा रस्ता ३ किमीवरील कालिदासाचे स्मारक पर्यंत जातो. रामटेकहून कालिदासाचे
स्मारक पर्यंत जाण्यासाठी एसटीची बससेवा नाही आहे. खाजगी वहानाने
येथेपर्यंत जाता येते. रामटेक गावातून बांधीव पायर्यांच्या मार्गाने १
तासात राममंदिरापर्यंत जाता येते. | |||
| राहाण्याची सोय : | |||
| गडावर रहाण्याची सोय नाही. | |||
| जेवणाची सोय : | |||
| गडावर हॉटेलांमध्ये जेवणाची सोय आहे, रामटेक गावात आहे . | |||
| पाण्याची सोय : | |||
| गडावरील हॉटेलांमध्ये पाणी मिळते. | |||
| जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||
| रामटेक गावातून बांधीव पायर्यांच्या मार्गाने १ तासात राममंदिरापर्यंत जाता येते. | |||
| जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
| वर्षभर | |||
| सूचना : | |||
| नागपूरहून खाजगी वहानाने अर्ध्या दिवसात रामटेक व नगरधन हे किल्ले पाहून होतात. | |||
रामटेक गडमंदिर आणि खिंडसी तलाव
रामगिरीच्या पायथ्याशी 'अंबाला तलाव' व 'अंबाला तीर्थ' आहे. राक्षसांचा संहार केल्यानंतर त्यांना मुक्ती देण्यासाठी रामाने 'भोगवती गंगा' निर्माण करून त्यात राक्षसांच्या अस्थी विसजिर्त केल्या. इथं स्नान केल्यानंतर अंबरीश राजाचे फोड नाहीसे झाले म्हणून या गावाला 'अंबाला' नाव पडलं, अशीही आख्यायिका आहे. येथील ब्राह्माण अंबाला तलावाच्या काठी क्रियाकर्म, विधी करतात. ते करवून घेणाऱ्यांचीही इथं नेहमीच गदीर् असते. तलावाच्या आजूबाजूला अनेक मंदिरं असून तलावात नौकाविहाराची सोय आहे. येथून काही अंतरावर एका पहाडीवर 'आयुवेर्दाचार्य नागार्जुन' यांचं मंदिर आहे. या पहाडीवर भुयारात महादेवाची पिंडदेखील आहे.
रामटेकपासून सुमारे चार किमी अंतरावर 'जपाळा' नावाचं गाव आहे. याठिकाणी श्रावणबाळ आपल्या आई-वडिलांना विश्रांती देण्यासाठी थांबला होता, अशी आख्यायिका आहे. या परिसरात मुबलक पाणी असल्यानं देश-परदेशातील स्थलांतरित पक्षीही इथं दिसतात. गडमंदिराच्या जवळच संस्कृत महाकवी कालीदासाचे स्मारक आहे. टेकडीवरील ह्या ठिकाणी कालीदासानं 'मेघदूतम्' हे अमरकाव्य लिहीलं होतं असं म्हणतात. कालिदास स्मारकात त्यांच्या 'रघुवंशम्', 'मालविकाग्निमित्रम्', 'मेघदूतम्', 'अभिजात शाकुंतलम्', 'विक्रमोर्वशियम्' आणि 'कुमारसंभवम् ' नाटकावर आधारीत रंगीत पेंटिंग्ज आहेत. ती चित्रकार वासुदेव आणि स्मार्त, शांताराम कामत, मुरली लाहोटी, मधु पोवळे, वामन करंजकर आणि दिनेश शहा यांनी काढलेली आहेत. नगरपालिकेतफेर् इथं प्रत्येकी पाच रुपये प्रवेश फी आकारली जाते. तरीही स्मारकाची डागडुजी किंवा इतर व्यवस्था मात्र दिसत नाहीत. छताचा काही भागही मोडकळीस आलेला आहे.
गडमंदिर टेकडीच्या पायथ्याशी रामटेक गावातील 'गवळीपुरा' वस्तीत अठराभुजा गणपतीचं अतिशय प्राचीन मंदिर आहे. हा गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे. या मंदिरापासून दीड किलोमीटरवर 'शांतीनाथ जैनमंदिर' आहे. भगवान शांतीनाथाचं मुख्य मंदिर असलेल्या या परिसरात एकूण नऊ मंदिरं आहेत. या देखण्या मंदिरांचं कोरीवकामही पाहण्यासारखं आहे. विदर्भातील जैन बांधवांची इथं नेहमी वर्दळ असते. येथील एका हॉलमध्ये जैन देवतांच्या, पंचधातूंच्या २४ मूर्ती ठेवलेल्या असून नव्यानं आकारास येणाऱ्या 'श्री चोबीसी जैन मंदिरा'त त्यांची प्रतिष्ठापना व्हायची आहे. गडमंदिराच्या खाली तीन-चार किलोमीटरवर हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला नयनरम्य खिंडसी तलाव आहे. तेथील उद्यानात नौकाविहारासाठी पॅडल बोट, वॉटर स्कूटर, स्पीड बोट या नौका तसंच अॅडव्हेंचर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. इथं असलेल्या एम.टी.डी.सी. हॉलीडे होम आणि खासगी हॉटेल्समध्ये राहण्याची सोय होऊ शकते. येथील अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि बोटींगच्या सोयीमुळे रामटेकला जाणारे बहुतेक पर्यटक खिंडसीला गेल्याशिवाय रहात नाहीत. इथं लवकरच पॅराग्लायडिंगचीही सोय उपलब्ध होणार आहे.
प्रभू श्रीरामांचे वनवास काळातील वास्तव्यस्थान आणि सीता मातेचे वनवास काळातील पहिले स्वयंपाकघर बद्दल जाणून घ्या.
Ramtek नावाचे नागपूरच्या ईशान्येस 60 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर एक निसर्गसंपन्न आणि विहंगम दृश्याने परिपूर्ण असलेले ठिकाण आहे. जितके धार्मिक तितकेच ऐतिहासिक. निसर्गाने ह्या भागाला भरभरून वरदान दिलेले आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा या डोंगराला पदस्पर्श झाला असल्याने रोज शेकडो भाविक प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी इथे येतात.
| Ramtek Attraction (रामटेक येथील प्रमुख आकर्षण) | Shri Ram Temple & Fort ((श्री राम मंदिर आणि गड ) |
| Ramtek Address (रामटेक पत्ता) | MH SH 249, Ramtek, Nagpur, Maharashtra, 441106, India |
| Ramtek Temple Timing ( रामटेक मंदिर वेळ) | 6.00 AM to 9.00 PM |
| Ramtek festival (रामटेक उत्सव) | Ram Navmi Utsav (राम नवमी उत्सव) |
| Nagpur to Ramtek Distance | 55 KM |
| Google Map | Click here |
रामायणातील मान्यतेनुसार प्रभू श्रीराम वनवासातील दण्डकारण्य ते पंचवटी हा टप्पा पार करत असताना पावसाळा सुरु झाला. त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यातील ४ महिने श्रीराम बंधू लक्ष्मण आणि सीता मातेसह रामटेक येथे थांबले होते.
रामटेकबाबत प्राचीन काळापासून चालत आलेली आलेली येथील एक आख्यायिका आहे. की, प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना या डोंगरावर आले होते आणि काही काळ विश्रांती घेतली होती. आपले अंग या एकांत ठिकाणी टेकवले आणि त्यांचा डोळा लागला. ‘राम’ या ठिकाणी ‘टेकले’ म्हणून या स्थळाला ‘रामटेक’ म्हणतात.
अगस्त्य मुनी आश्रम | Agastya Muni’s ashram
या भागात अगस्त्य ऋषिंचा आश्रम होता. आणि येथेच प्रभू श्रीरामांनी वास्तव्य केले होते. प्राचीन मान्यतेनुसार अगस्त्य मुनींनी प्रभू श्रीरामांना रावणासंदर्भात माहिती येथेच दिली होती. श्रीरामांनी राक्षसांचा नाश करण्याची शपथ देखील येथेच घेतली.
रामायणातील मान्यतेनुसार प्रभू श्रीरामांनी अगस्त्य मुनी ह्यांच्याकडून ४ महिने अस्त्र-शस्त्र आणि शास्त्र विद्येचे प्रशिक्षण घेतले. प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करण्यासाठी वापरलेले ब्रम्हास्त्र त्यांना ह्याच आश्रमातून अगस्त्य मुनी ह्यांच्या कडून मिळाले होते. आजही हे आश्रम मंदिर रामटेक येथे पाहावयास मिळते.
Kapurbawdi (कपूरबावडी) सीता मातेचे वनवास काळातील पहिले स्वयंपाकघर
प्रभू श्रीरामाच्या रामटेक येथील वास्तव्यादरम्यान सीता मातेने वनवास काळातील आपले पहिले स्वयंपाकघर येथे मांडले होते. प्रभू श्रीरामचंद्रांनी सर्व ऋषीमुनींना बोलावून येथे त्यांना अन्नदान केले होते. ह्याचा उल्लेख पद्य पुराण मधील सिंदुरागिरी महात्म्य मध्ये येतो.
कपूरबावडी मधील स्थापत्य कला बघून डोकं चक्रावून जाते आणि मनात एक प्रश्न उपस्थित होतो, त्या काळी एवढे मोठे दगड कुठून आणले असतील? येथील बांधकाम हे कुठलेही सिमेंटचा वापर न करता फक्त एकावर एक दगड रचुन केलेले आहे. वर्षाचे बारा महिने कपूरबावडी मध्ये मुबलक पाणी उपलब्ध असते. येथील बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे राम मंदिरातील आरती आणि घंटानाद येथे स्पष्टपणे ऐकू येतो.
रामटेक गड मंदिर | Sri Ram Temple & Fort
रामटेक डोंगरावर प्रभू रामचंद्राचे ६०० वर्ष जुने प्राचीन मंदिर आहे. या स्थळावर प्रभू रामचंद्राची पावले होती आणि अनेक पूर्व पिढ्यांनी त्याचे दर्शन घेतलेले आहे अशी माहिती गावकरी देतात.
त्यानंतर १८ व्या शतकात नागपूरच्या भोसले राजेंच्या अधिपत्याखाली हा परिसर आला आणि भोसले घराण्याचे कुलदैवत म्हणून येथे प्रभु रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना करून मंदिर बांधण्यात आले.
नागपूरच्या भोसले घराण्यातील महान पराक्रमी प्रथम रघुजी राजे भोसले यांनी देवगड मधील युद्धात विजय मिळाला तर प्रभू श्रीरामांची पावले असलेल्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करण्याची प्रतिज्ञा केली. आणि अपेक्षेपेक्षा सुद्धा मोठा विजय त्यांना युद्धात प्राप्त झाला. त्यांनतर राजेंनी जयपूर येथून प्रभू श्रीरामांची मूर्ती मागवली.पण प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी त्यांना स्वप्नी दृष्टांत झाला. ह्यामध्ये श्रीरामांनी राजेंना सूर नदीमध्ये सुरक्षित असलेल्या त्यांच्या मूर्तीची स्थापना करा असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी राजेंनी आपले सैन्य मूर्ती शोधण्यासाठी रवाना केले. आश्चर्य म्हणजे नदीमध्ये प्रभू श्रीराम, सीतामाई, आणि लक्ष्मण ह्यांच्या मुर्त्या सापडल्या. सन्मानपूर्वक त्या मूर्ती गडावर आणून त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली गेली.
हे मंदिर पश्चिमेच्या सर्वात उंच भागावर असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून या डोंगरावर येण्यास पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी वर आल्यावर प्राचीन तळे दिसते. अनेक बुरुज व मिनार याच्या सभोवताली बघायला मिळतात. मंदिरामध्ये प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला ‘वराह दरवाजा’ आहे. हा भव्य परिसर चांगला सुशोभित केला आहे.
विस्तीर्ण परिसरातल्या आतल्या छत्रीत वराहरूपी विष्णूच्या अवताराची मोठी मूर्ती आहे. त्या पलीकडे आणखी तीन दरवाजे आहेत. सिंधपूर दरवाजा हा दुसरा दरवाजा असून त्यातून आतल्या तटबंदीत प्रवेश मिळतो तर भैरव दरवाजातून आतल्या शेवटच्या तटबंदीत प्रवेश मिळतो.
या ठिकाणी राजा दशरथ व वसिष्ठ मुनी यांची देवळे आहेत. लक्ष्मणाचे मंदिर समोरच दिसते व त्यामागे राम व सीतेचे मोठे देऊळ दिसते. मंदिराच्या बाहेरचा परिसर अतिशय मोठा आहे आणि दोन्हीबाजूला लहान मंदिरांची रांग असून सर्वात शेवटी प्रमुख राममंदिर आहे. संपूर्ण परिसरात वानरांचा मुक्त संचार अनुभवता येतो.
कवी कालिदास स्मारक
महाकवी कालिदास एक वर्षासाठी रामटेक येथे आले होते. त्यांना उज्जैनच्या राजाने पाठवले होते. कवी कालिदासांनी आपल्या मेघदूत ह्या ग्रंथाची रचना रामटेक येथेच केलेली आहे. आज इथे भव्य कालिदास स्मारक आपल्याला पहावयास मिळते. तसेच इथे थाटामाटात कालिदास महोत्सव देखील साजरा केला जातो. येथे संस्कृतच्या अभ्यासाकरिता स्थापन करण्यात आलेले रामटेकचे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ एकदा भेट द्यावी असे आहे.
रामटेक, नागपूर येथील वाकाटक कालीन मंदिरे
अनेक जण रामटेकला त्याच्या धार्मिक महत्त्वामुळे जातात, काही
कालिदासाच्या संबंधांमुळे तर काही भोसल्यांच्या मंदिरांमुळे. पण, बहुतांशी
लोकांना येथील वाकाटककालीन मंदिरांबद्दल माहिती नसते. आता आतापर्यंत,
रामटेक परिसरात तुलनेने साधी दिसणारी काही मंदिरे, त्यावरील चुन्याच्या
थरांमुळे भोसले काळातील (त्या काळात जीर्णोद्धार झाला होता) दुय्यम समजली
गेली. पण, तत्कालीन राज्य पुरातत्व खात्याचे संचालक, डॉ. अ. प.
जामखेडकरांनी प्रयत्नपूर्वक चुना काढून या मूळ वाकाटककालीन (इ.स. ४-५वे
शतक) दगडी मंदिरांचे स्वरूप सर्वांसमोर आणले. यामध्ये रुद्र नरसिंह मंदिर,
केवल नरसिंह मंदिर, भोगराम मंदिर, गुप्तराम मंदिर, वराह मंडपाचा समावेश
आहे.
आपल्याला गुप्त वाकाटक काळ हा मंदिर विकास प्रक्रियेतील आरंभीचा काळ या मंदिरांच्या बांधणीतून दिसतोच व त्यांचा वाकाटक काळातील असण्याचा सबळ पुरावा आपल्याला केवलनरसिंह मंदिरातील प्रभावती गुप्त (वाकाटकांची सून असलेली गुप्त राजकन्या) हिच्या ब्राह्मीलिपीतील शिलालेखात आढळतो. रुद्र नरसिंह व केवल नरसिंह मंदिरातील महाकाय नरसिंहांच्या मूर्ती विलक्षण असून सुखासनात एका हातात चक्र घेतलेले आढळतात. जगतीवर (पीठावर) उभ्या असलेल्या रुद्र नरसिंह मंदिरात बाहेरील बाजूने आठ पाण्याची कुंडं दिसतात. दोन्ही मंदिरांच्या द्वारशाखेवरील तुंदिलतनु यक्षगणांच्या मूर्ती अजिंठ्यातील यक्षप्रतिमांची आठवण करून देतात. भोगराम मंदिर हे द्विगर्भी मंदिर एका आयताकृती मंडपाने जोडले आहेत; सध्या तिथे महानुभवांचे ठाणे आहे. यज्ञवराह हे विष्णू अवतारातील प्राणीस्वरूप आपल्याला चारखांबी वाहन मंडपात दिसते. त्रिविक्रम मंदिर बहुतांशी नष्ट झाले असले तरी त्रिविक्रम मूर्ती सौष्ठवयुक्त असून मंदिराच्या भागांवरील कोरीव काम लक्ष वेधून घेते.

























No comments:
Post a Comment