Friday, April 28, 2023

सातगाव व साकेगाव मंदीर

   बुलढाणा जिल्हा म्हणजे पहिले डोळ्यासमोर येते ते लोणारचे जगप्रसिद्ध तळे. सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या जिजाऊ बाईसाहेब याही बुलढाण्याच्या. पण पुरातन हेमाडपंती मंदिरांची रेलचेल असलेला जिल्हा ही बुलढाण्याची फारशी प्रचलित नसलेली ओळख आहे. खरेच! बुलढाण्यात जवळजवळ तीसेक किलोमीटरच्या अंतरात अशी मंदिरं दिसतात. यावरून इथे आर्थिक राज्यकर्त्यांची स्थिती उत्तम असणार यात संदेह नाही. साधारण बाराव्या शतकाच्या आसपास बांधलेल्या या मंदिरांची मध्ययुगात दुरवस्था झाली असली तरी आजही ती आपलं पुरातत्वीय महत्त्व सांभाळताना दिसतात.

    इतकी मंदिरं एकाच विभागात आढळणं म्हणजे त्या विभागात किती सुबत्ता असावी याचं निदर्शक आहे. एकाच भागात मध्ययुगात बांधली गेलेली इतकी मंदिरं अन्यत्र कुठेही निदर्शनास पडत नाहीत. मंदिरं म्हणजे ऐतिहासिक समृद्धीचं प्रतीक समजली जातात. ही सगळी गावं त्या काळातल्या सत्तेची महत्त्वाची ठाणी असणार. कालांतराने आधुनिक काळात हा भाग शहरीकरणाच्या नादात दूर गेला आणि ही गावं एकेकटी मागे राहिली. बुलढाण्याच्या प्रत्येक मंदिराचं आपलं खास वैशिष्टय़ आहे. चिखली या महत्त्वाच्या शहरापासून जवळ अशीच दोन खास मंदिरं आहेत. सातगाव भुसारी आणि साकेगावची ही दोन शिवमंदिरं म्हणजे मंदिर स्थापत्याची उत्कृष्ट उदाहरणं ठरलेली आहेत.ही मंदिरे बघितल्यावर पुरातन बांधकाम शैली किती विकसित होती, याचा प्रत्यय येतो़  लाकडावरही विविध यंत्राच्या सहायाने सध्याच्या काळातही कोरीव काम करणे शक्य होणार नाही, तसे कोरीव काम दगडावर करण्यात आले आहे़.  बाराव्या शतकापूर्वी मंदिरांचे बांधकाम झाले असावे, असा अंदाज आहे. काळया पाषाणांपासून हे मंदिर बांधण्यात आले आहे़ या दगडांवर कोरलेल्या मूर्ती व शिल्प अप्रतिम आहेत़.  

       सातगाव भुसारी हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एक लहानसे खेडे आहे. चिखली वरून बुलढाणा कडे जाताना सात किलोमीटर अंतरावर हातनी फाटा लागतो. येथून लोक सैलानी बाबाला जातात. अर्थात सैलानी बाबाला जाण्यापूर्वी अलीकडेच सातगाव भुसारी हे लहानसं गाव लागतं. रस्त्याच्या अगदी डावीकडे बघितल्यावर काही मंदिरांचा समूह नजरेत भरतो. येथील मंदिर समूह बघितल्यावर विदर्भातील प्राचीनतम समृद्ध शिल्पकलेची जाणीव होऊन जाते.येथील प्रसिद्ध विष्णू, महादेव मंदिर व सीता न्हाणी हि सर्व मंदिरे १२ व्या शतकातील असून अतिशय सुंदर आहेत त्यात विष्णू मंदिर तर खूप सुंदर दिसते.... विष्णू मंदिर हे तिन्ही मंदिरं मंध्ये अजूनही जसे च्या तसेच दिसते बाकी दोन्ही मंदिरांपेक्षा ह्या मंदिरावर जास्त कोरीव काम केले गेले आहे.येथील मंदिर समूह पूर्वी बरीच मंदिरे होती असे महाराष्ट्राचे पूरातत्त्व म्हणत. आज मात्र येथे तीन प्रमुख मंदिर दिसतात. त्यापैकी सर्वात प्रमुख आणि मोठे म्हणजे विष्णू मंदिर होय.

विष्णू मंदिर-

 हे मंदीर भुमिज स्थापत्याचा नमुना असून अर्धमंडप, मंड्प, अंतराळ आणि गर्भगृहे यावरील शिखरे आज पुर्णपणे शाबुत नसली तरी गर्भगृह सप्तरथ प्रकारचे असून शिखर सप्तभुमप्रासाद प्रकारचे असावे हा निष्कर्श काढण्याइतपत अवशेष शिल्लक आहेत. मंदीर पश्चिमाभिमुख असून पुढे मुख मंडप व दोन बाजुला दोन अर्धमंडप असलेला अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा तलविन्यास आहे. तीन अर्धखुले अर्धमंडप व अर्धखुला मंडप याची रचना अशी आहे. कि तिन्ही प्रवेशमार्गातून मंडपाच्या मध्यभागी असलेल्या चतुष्कीपर्यंत जाता येईल. चतुष्कीच्या भागात रंगशीला आहे.
छताचा भार तोलून धरणारे लघु स्तंभ

विष्णू मंदिर हे ताराकृती गर्भगृहाचे असून त्याला प्रशस्त असा सभामंडप आहे. या सभामंडपाला तीन द्वार आणि त्यावर तीन मुखमंडप आहेत. सभामंडपाचे छत उतरत्या बांधणीची आहे.संपूर्ण छत हे लहान- लहान स्तंभांवर आधारलेले आहेत. आणि या सभामंडपाला कठड्या सारखी दिसणारी अर्ध भिंत आहे. 
कठड्यावरील कोरीव लघु स्तंभ आणि स्त्री शिल्पे
या कड्याच्या भिंतीवर लहान-लहान स्तंभ आकृती कोरलेल्या आहेत. मध्ये हार नक्षी कोरलेली आहे.
मंदिराचे छत तोलून धरणाऱ्या तुळ्यांवर सप्तमातृका

 तसेच दोन स्तंभ आकृतीच्या मध्ये विविध मुद्रेची स्त्री शिल्पे कोरलेली आहेत.मुख्य मंडपाच्या आतील शब्द गोलाकार घुमट सारखे आहे. त्यात बोल पट्टा असून मध्यभागी पाकळ्यांचे झुंबर कोरलेले आहेत. या घुमटा भोवती चार कोप-यावर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. 

तिन्ही मुख् मंडपाच्या छतावरील गोल घुमटाकार नक्षीकाम व झुंबर

असेच सभामंडपाच्या तिन्ही मुख मंडपाची रचना आहे.सभामंडपाच्या मध्यभागी तुळ्यांमुळे चौरस निर्माण झालेला आहे. चौरसाच्या तुळ्यांवर आतून सप्तमातृका कोरलेल्या आहेत. मध्यभागी चौरसात झुंबर कोरलेले आहे.
स्तंभशीर्ष यावरील कीचक-
या चौरसाच्या चार कोप-यावर सभामंडपाचे प्रमुख चार स्तंभ खडे आहेत. सभामंडपाच्या बाहेरील स्तंभा प्रमाणे ते लघुतम नसून पूर्ण असलेले चार स्तंभ आहेत. अर्थात या सभामंडपाच्या छताचे हे प्रमुख चार स्तंभ होय. या स्तंभावर घट्ट-पल्लव आहे. आणि वर भारवाहक किचक आहेत. विशेष म्हणजे दोन कीचका मध्ये एक लहानसा चतुर्भुज किचक आहे. ह्या मंदिराच्या खांबाचे वैशिष्ट्य होय.
दोन भारवाहक किचकांमध्ये एक चतुर्भुज कीचक

येथील या विस्तीर्ण सभामंडपाच्या छताच्या आतील बाजूस उतरत्या कृष्णकमळाच्या पाकळ्यांची रचना केलेली आहे. अशी अप्रतिम रचना इतर कोठेही ही बघायला मिळणार नाही अशीच आहे. येथील कोल्हापूर नाचत बघून माउंट आबू पर्वतावरील दिलवाडा मंदिराची नक्कीच आठवण होईल. 

चंद्र शिळेच्या दोन्ही बाजूस कीर्तिमुखे आणि कुमुद
भद्रपीठा सनावर गज, देवी आणि सर्वात वर हात जोडलेला गरुड

मंदिराच्या गाभाऱ्या भोवती देव कोष्टके आहेत. मंदिराच्या पीठ आसनावर देवमुर्ती नाही. तरी पीठासन वरील देव आकृतीवरून मंदिराच्या देवतेचा अर्थ कळतो. सिंहासनाच्या खालच्या बाजूस दोन गज प्रतिमा कोरलेल्या आहेत. मध्यभागी शंख-पुष्प धारी देवीची प्रतिमा आहे. सर्वात वर हात जोडलेला गरुड आहे. गरुड हे विष्णूचे वाहन असल्यामुळे या पीठांवरील मूर्ती विष्णूची होती हे स्पष्ट होते.

कृष्णकमळाच्या उतरत्या पाकळ्यांचा संपूर्ण सभा मंडपाला वेढा आणि छतावरी दगडी झुंबर

   मंदीराच्या बाह्य अंगावर रथिकाचा अपवाद वगळला तर जंघा पातळीचर मनुष्याकृतीची शिल्प नाहीत. मंदीर भुमिज शैलीचे असले तरी कुटस्तंभावरील शिखरे भुमिज प्रकारची नसून लतिन नागर  पध्दतीची आहेत. मंदीराच्या बाह्य अंगावर पीठाच्या वर वेदीका असून  वेदैकेवर कुटस्तंभ आहेत. दोन कुटस्तंभाच्या मधल्या भागात सुरसुंदरीची मुर्तीशिल्प आहेत. त्यावर एकेकाळी कक्षासन असावे , पण आज ते शिल्लक नाही. शुकनासेचा फक्त खालचा भाग शिल्लक आहे.    
   या मंदिरावर पुरातत्व खात्याच्यावतीने रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे़.  मंदिरावरील शेवाळ व धूळ निघाल्यामुळे मंदिर उजळले आहे़ विष्णू मंदिराचा अर्धमंडप, मंडप, अंतराल आणि गर्भगृह यावरील शिखरे सध्या पडली आहेत़.  याची डागडुजी करण्यात आली आहे़  विष्णुचे मंदिर पश्चिमाभिमुख असून, पुढे मुखमंडप व दोन बाजुला दोन अर्धमंडप असलेला अर्धखुला मंडप आहे. येथे तीन अर्धखुले मंडप असल्यामुळे मंदिरात तिन्ही बाजुंनी जाता येते़. 



  या मंदिराच्या अगदी समोर एक लहानसे मंदिर आहे. याचे गर्भगृह असून बाहेर काही स्तंभ खडे आहेत. संपूर्ण मंदिर पडक्या अवस्थेत आहे. आतील बाजूस देव कोष्टके आहेत. गर्भगृहातील पीठासनावर मूर्ति नाही. हे कदाचित ब्रह्माचे मंदिर असावे.

त्याच्या शेजारीच एक नाला वाहतो. मला ओलांडून पलीकडे गेल्यास या समूहातील तिसरे मंदिर म्हणजेच महादेवाचे मंदिर दिसते.

महादेव मंदिर-

मंदिराच्या मागील बाजूस महादेवाचं मंदिर असून त्याची स्थिती अधिक दुःखदायी आहे. नंदीचे मुख भग्नावस्थेत आहे. मंडपाचं वितान (छत) तुटलेल्या अवस्थेत आहे. मंदिराची बरीच पडझड झाली असावी, कारण डागडुजी करताना सिमेंट, विटा वापरल्याने नव्याजुन्याचा ओबडधोबड मिलाफ बघायला मिळतो. 
महादेवाचे मंदिर चौरस आकृती आहे. या मंदिराच्या अर्ध भिंतीवरही विष्णू मंदिर प्रमाणे लघु स्तंभ कोरलेले आहेत. नक्षी असून काही ही प्रतिमा कोरलेल्या आहेत.
मंदिरात खांबांवर घटपल्लव कोरलेले दिसतात. एकंदर कोरीव काम लाकडावर करावे इतके अतिशय नाजूक हातांनी केलेले दिसते. मंदिर परिसर अनेक भग्न मूर्तींच्या अवशेषांनी सजलेला दिसतो.
या मंदिराचे द्वार अतिशय कलापूर्ण असे आहे. सर्वात वर भूमितीय नक्षी कोरलेली आहे. मध्यभागी देवीची आकृती कोरलेली आहे. ती बहुदा पार्वती असावी. त्याखाली लाट पट्टीवर कोष्टकात पाच देवता आहेत. आणि ललाट बिंबावर श्री गणेश मूर्ती कोरलेली आहे.
द्वाराच्या बाजूस अर्धस्तंभ आहेत. सर्वात आतल्या बाजूस पुष्प हार नक्षी कोरलेली आहे. स्तंभाच्या बाजूस व्याल शाखा कोरलेली आहे.

















मंदिराच्या आत मध्यभागी शिवपिंडी आहे. एका बाजूस नागदेवता कोरलेली आहे. मंदिराचे स्तंभ प्रचंड असून मध्यभागी घट्ट पल्लव आहेत.


  मंदिरावरील समोरच्या भागात प्रवेशव्दारावर बारिक शिल्पकृती कोरण्यात आली आहे़.  दगडावर केलेली ही अप्रतिम कलाकृती पाहून मन थक्क होते़.  या परिसरात विविध मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत़  या मूर्ती कोणत्या कालखंडात बनविण्यात आल्या असून, कुणाच्या आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे़.  येथे चार फूट उंच सुर्यपत्र रेवंतची मूर्ती आहे़.  येथे देवी व देवतांच्या मूर्ती कोरल्या असलेले दगड पडलेले आहेत़ यापैकी काही मूर्ती पुर्ण तर काही मूर्ती भंगलेल्या आहेत़  या मूर्ती  देवदेवतांच्या आहेत़. 
इथे कसे पोहोचाल :
 सातगाव भुसारी हे गाव खामगाव चिखली रोडवर येत चिखलीतुन इथं येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत.. सातगाव चिखलीपासून १० कि.मी. तर बुलढाण्यावरुन २० कि.मी., खामगावपासून ६५ कि.मी. मलकापुर रेल्वे स्टेशनपासून ६५ कि.मी. तर छत्रपती संभाजीनगरपासून १३६ कि.मी. आहे. 

संदर्भ :-

 १) बुलढाणा जिल्हा गॅझेटीयर 
२) स्थापत्य - अरुणचंद्र पाठक
३) https://hindutemples--india-blogspot-com.translate.goog/2022/07/satgaon-group-of-temples-maharashtra.html?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc
४) https://www.facebook.com/rjdipakofficial/posts/163878644170694/
५) https://faktitihas.wordpress.com/
६)  https://secrettemples.com/
७)  https://hindutemples-india.blogspot.com/2022/07/satgaon-group-of-temples-maharashtra.html
८ ) नीती मेहेंदळे यांचे लिखाण megmehen@gmail.com

 https://www.saamana.com/article-by-niti-mehandale-on-buldhana-temples/


जैन मंदिर:

मंदिर परिसर में चौथा मंदिर जैन मंदिर है। चार खड़े खंभों को छोड़कर मंदिर पूरी तरह से खो गया है। इस मंदिर के उत्तर पश्चिम में एक बड़ा पीपल का पेड़ स्थित है। इस वृक्ष के चारों ओर चबूतरा बना हुआ है। इस चबूतरे पर कुछ प्राचीन मूर्तियां हैं। मूर्तियों में से एक जैन तीर्थंकर पार्श्वनाथ की है, जिस पर 1251 सीई का एक शिलालेख है। हो सकता है कि यह छवि इस मंदिर के गर्भगृह में स्थापित की गई हो। इस चबूतरे में जैन देवी की एक खंडित मूर्ति मिली है। उसके सिर के शीर्ष पर बैठे जैन तीर्थंकर की नक्काशी के साथ एक फूल का ताज है।


श्रावण विशेष : सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा










लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 10:18 AM2021-08-23T10:18:12+5:302021-08-23T10:20:06+5:30

Shravan Special: Historical Heritage Preserving the Temple of Lord Mahadev at Satgaon and Sakegaon | श्रावण विशेष :  सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा

श्रावण विशेष :  सातगाव व साकेगाव येथील महादेवाचे मंदिर जपतेय ऐतिहासिक वारसा 

-  विवेक चांदूरकर
खामगाव : बुलडाणा, चिखली, मोताळा या तीन तालुक्यांमध्ये चाळीस ते पन्नास किमी अंतरावर काही प्राचिन मंदिरे निदर्शनास पडतात़.  एकाच भागात मध्ययुगीन काळात बांधल्या गेलेली एवढी मंदिरे अन्यत्र कुठेही निदर्शनास पडत नाहीत़.  ही मंदिरे मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक समृद्घता दर्शवितात. कधी काळी या गावांमध्ये मोठी वस्ती होती़.  ही गावे सत्तेची केंद्र होती़.  मात्र, कालांतराने काळाच्या ओघात शहरीकरणामुळे ही गावे ओस पडत गेली़.  पुरातत्व खात्याने ही मंदिरे ताब्यात घेतली व अनेक बंधने लादली़ त्यामुळे आता भक्तांची गर्दीही येथे होत नाही़. या मंदिरांबाबत अजून कुणी संशोधन केले नसल्यामुळे आपला इतिहासही खूपच कमी लोकांना माहिती आहे़.  या मंदिरांपैकी दोन मंदिरे सातगाव आणि साकेगावला आहे़.
    ही मंदिरे बघितल्यावर पुरातन बांधकाम शैली किती विकसित होती, याचा प्रत्यय येतो़  लाकडावरही विविध यंत्राच्या सहायाने सध्याच्या काळातही कोरीव काम करणे शक्य होणार नाही, तसे कोरीव काम दगडावर करण्यात आले आहे़.  बाराव्या शतकापूर्वी मंदिरांचे बांधकाम झाले असावे, असा अंदाज आहे. काळया पाषाणांपासून हे मंदिर बांधण्यात आले आहे़ या दगडांवर कोरलेल्या मूर्ती व शिल्प अप्रतिम आहेत़.  चिखलीपासून पाच ते सहा किमी अंतरावर असलेल्या सातगाव येथे प्राचिन मंदिर आहे़ या परिसरात चार मंदिरे आहेत़ एका मंदिरात महादेवाची पिंड आहे़. या चारही मंदिरावर चहुबाहुने शिल्प, विविध मूर्ती व नक्षीकाम कोरले आहे़  संपूर्ण दगडाचे असलेल्या या मंदिर परिसरात काही अन्य मूर्तीही पडल्या आहेत़  यापैकी सर्वात मोठे असलेले विष्णू मंदिर भूमिज स्थापत्याचा नमुना आहे़.  या मंदिरावर पुरातत्व खात्याच्यावतीने रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे़.  मंदिरावरील शेवाळ व धूळ निघाल्यामुळे मंदिर उजळले आहे़ विष्णू मंदिराचा अर्धमंडप, मंडप, अंतराल आणि गर्भगृह यावरील शिखरे सध्या पडली आहेत़.  याची डागडुजी करण्यात आली आहे़  विष्णुचे मंदिर पश्चिमाभिमुख असून, पुढे मुखमंडप व दोन बाजुला दोन अर्धमंडप असलेला अर्धखुला मंडप आहे. येथे तीन अर्धखुले मंडप असल्यामुळे मंदिरात तिन्ही बाजुंनी जाता येते़. 
    या मंदिराच्या मागच्या बाजुला महादेवाचे मंदिर आहे़ या मंदिरामध्ये नागाची मूर्ती ठेवलेली आहे़.  मंदिरावरील समोरच्या भागात प्रवेशव्दारावर बारिक शिल्पकृती कोरण्यात आली आहे़.  दगडावर केलेली ही अप्रतिम कलाकृती पाहून मन थक्क होते़.  या परिसरात विविध मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत़  या मूर्ती कोणत्या कालखंडात बनविण्यात आल्या असून, कुणाच्या आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे़.  येथे चार फूट उंच सुर्यपत्र रेवंतची मूर्ती आहे़.  येथे देवी व देवतांच्या मूर्ती कोरल्या असलेले दगड पडलेले आहेत़ यापैकी काही मूर्ती पुर्ण तर काही मूर्ती भंगलेल्या आहेत़  या मूर्ती  देवदेवतांच्या आहेत़.  


साकेगाव येथील मंदिर   

    साकेगाव येथे मध्ययुगातील बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले दगडाचे मंदिर आहे़ परिसरातील ग्रामस्थांचे दैवत असलेल्या या मंदिरावर चहुबाहुने उत्कृष्ट शिल्प व मूर्ती कोरलेल्या आहेत़. आतमध्ये महादेवाची पिंड असून, मूर्तीच्या चहुबाजुने देवी, देवतांच्या मूर्ती आहेत़  या मंदिरालगत आणखी एक छोटे मंदिरही आहे़ तसेच मंदिरासमोर एक गध्धेगळ आहे़ तसेच यावर एक शिलालेखही असून, त्याचे वाचन होणे गरजेचे आहे़.    
    हे शिवमंदिर पुर्वाभत्रमुख असून, मुखमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह आहे़  मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर बरेच मोठे असून यावर  मूर्ती कोरल्या आहेत़ मंंदिरामध्ये प्रवेश करण्याकरिता दगडी खांबांचे प्रवेशव्दार होते़  त्याची आता पडझड झाली आहे़.  या खाबांवरील छत पडले आहे़.  या व्दारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर मुख्य मंदिराचे व्दार आहे़.  या मंदिराचे बांधकाम साधारणता बाराव्या शतकात झाले असावे़  याच काळात कोथळी, सातगाव, धोत्रा नंदई येथील मंदिरांचे बांधकाम झाले आहे़  मंदिराचे शिखर उंच आहे़.  मंदिराच्या शिखरावर असलेल्या शिल्पपटात ब्रम्ह, सरस्वती, महादेव- पार्वती व विष्णु- लक्ष्मीच्या प्रतिमा आहेत. तसेच महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमाही आहेत.  या मंदिराला २०१६ साली कुंपण घालण्यात आले. गावातील भाविक नियमित येथे येवून दर्शन घेतात़  मंदिर पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी होेते़.

 https://www.lokmat.com/jarahatke/shravan-special-historical-heritage-preserving-temple-lord-mahadev-satgaon-and-sakegaon-a310/

 

 विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीपासून अंदाजे १०/१२ कि.मी अंतरावर सातगांव आणि साकेगांव ही दोन अप्रतिम प्राचीन मंदिरे असलेली गावे आहेत. आज आपण त्यातल्या साकेगांवचे साकेश्वर मंदिर बघु. 
    चिखलीपासून पश्चिमेस सहा मैलांवर एका छोट्या खेड्यात साकेगाव येथे हे साकेश्वराचे एक अप्रतिम मंदिर पाहिले की दक्षिणेत आल्याचा भास होतो !  साकेगाव येथे मध्ययुगातील बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले दगडाचे मंदिर आहे़ परिसरातील ग्रामस्थांचे दैवत असलेल्या या मंदिरावर चहुबाहुने उत्कृष्ट शिल्प व मूर्ती कोरलेल्या आहेत़. आतमध्ये महादेवाची पिंड असून, मूर्तीच्या चहुबाजुने देवी, देवतांच्या मूर्ती आहेत़  या मंदिरालगत आणखी एक छोटे मंदिरही आहे़ तसेच मंदिरासमोर एक गध्धेगळ आहे़ तसेच यावर एक शिलालेखही असून, त्याचे वाचन होणे गरजेचे आहे़. एकेकाळी या मंदिराचा विमानाचा भाग पडला होता तो पुरातत्व खात्याने पुनश्च जसाच्या तसा दगडामध्ये बांधून काढला. आता त्याच्या या सुंदर शिखरावरील नक्षीकाम आपणास बघावयास मिळतो.
 
           साकेगांवाच्या पश्चिमेला गावाबाहेर एका टेकडीच्या पायथ्याजवळ हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या आजुबाजुला स्थानिक शेतक-यांची शेते आहेत. मंदिर शंकराचे असुन एका मोठ्या प्रांगणात आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराचा मुखमंडप, मंडप, अंतराळ व गर्भग्रुह असा प्लॅन आहे. मंदिराचा मंडप बंदिस्त असल्याने या मंडपाला आपण गुढमंडप असे म्हणु शकतो. मंदिर व मंदिराचे शिखर हे काळ्या पाषाणात बांधलेले असुन मंदिर गुढमंडपामुळे बंदिस्त दिसते.
 
 
 
 
 
 
 
       हे शिवमंदिर पुर्वाभत्रमुख असून, मुखमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह आहे़  मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर बरेच मोठे असून यावर  मूर्ती कोरल्या आहेत़ मंंदिरामध्ये प्रवेश करण्याकरिता दगडी खांबांचे प्रवेशव्दार होते़  त्याची आता पडझड झाली आहे़.  या खाबांवरील छत पडले आहे़.  या व्दारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर मुख्य मंदिराचे व्दार आहे़. मुखमंडप आणि मंडपाच्या मध्यभागाला घुमटाकार छत आहे. मंडपाच्या छताच्या उर्वरित भागाना प्रत्येक स्तरावरील तुळ्या छेदतात अशी रचना आहे. 
 
 
 
 
स्तंभाची रचना किंवा प्रकार सातगाव येथील मंदीरासारखाच असून चौरस तळखडा, त्यावर सपाट खांब, त्यवर उदगमासारखा घटक, अष्टकोनी घटक, पुर्णकलश, कुंभशीर्ष आणि त्यावर कीचकहस्त असे त्याचे स्वरुप आहे. जे स्तंभ मंदीराच्या महत्वाच्या जागेवर त्या स्तंभावर पुर्णकलश दिसतात. तर जे स्तंभ तुलनेने दुय्यम स्थानी आहेत, त्या स्तंभावर अष्टकोनी किंवा चौरस पट्ट दिसून येतात.
 
 
 
 
 
  
 
 
   मंदीराचा सर्वाधिक उल्लेखनीय भाग म्हणजे शुकनास किंवा गर्भगृहावरील भुमिज शिखर होय, या मंदिराचे सर्व सौंदर्य या मंदिराच्या कळसात एकवटले आहे. मंदिराचे शिखर भव्य आणि उंच असून नक्षीदार आहे. त्यावर अनेक लहान-लहान मंदिराच्या शिखर आकृती कोरलेल्या आहेत.या शिखराचे अमलकापर्यंतचे सर्व भाग अजुनही व्यवस्थित जागेवरच आहेत. भूमिज शैलीचे इतके सुंदर व शाबुत (Intact) अवस्थेतले शिखर बघायला मिळणे हा फारच दुर्मिळ योग आहे. गर्भग्रुहावरील शिखर व त्याला जोडुन असलेल्या अंतराळावर या शिखराच्या शुकनासिकेचा भाग असुन त्या मधे समोरच्या व दोन्ही बाजूंवर तीन तीन स्तरांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत.शुक नासिकेवर दर्शनी बाजूस भूज नटेश असून त्याच्या खाली तीन शिल्पपटात अनुक्रमे ब्रह्मा-सरस्वती शिवपार्वती व विष्णुलक्ष्मी आहेत तसेच दक्षिणोत्तर भागावर सरस्वती इंद्र व महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमा आहेत.   शुकनास सातगाव येथील भुमिज विष्णु मंदीराप्रमाणे दुमजली असून तीच्या तळाशी हत्ती दाखवले आहेत.  शुकनासेच्या दर्शनी भागात तिहेरी कमान असून हि कमान कीर्तिमुखाच्या तोंडातून बाहेर पडल्याचे दाखवले आहे. या कमानीच्या खालच्या तीन पट्टामध्ये ब्रम्हदेव, विष्णु आणि महेश आहेत. आणि मुख्य कमानीच्या मधोमध ध्यानस्थ बसलेला महेश दाखवला आहे. शुकनासेचा बर्याच भागाचा जीर्णोध्दार झालेला आहे. शुकनासेच्या प्रत्येक बाजुवर तीन लहान देवळे असून एकंदरीत सहा स्तंभकुट आहेत.
 मुखमंडपावर फांसणा शैलीसारखे शिखर आहे तर मंदिराच्या मंडपावर शिखर नाही व मंडपाचे छत वरुन सपाट आहे. मंदिराचे शिखर पुर्वी कधीतरी पडलेले होते पण ब्रिटीश राजवटीच्या काळात या मंदिराच्या कळसाची मंदिर परिसरातच पडलेले अवशेष वापरुन डागडुजी करण्यात आली. ही डागडुजी इतकी उत्तम पध्दतीने करण्यात आली की कधीकाळी मंदिराचे शिखर पडले होते व ते पुन्हा बांधण्यात आले असावे याची पुसटशी शंकाही आज आपल्याला येत नाही. मात्र Henry Cousins यांच्या Medieval Temples of Deccan या १९३१ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात वापरलेल्या फोटोंमध्ये या मंदिराचे शिखर पडलेले आहे.
 
Glorious Past
 

  
 
Frontal View
Hemadpanti Architecture
 
Temple Premise
       हे मंदिर गाभारा, अंतराळ, गूढमंडप व मुख मंडप युक्त आहे. सध्या मंदिराच्या मुख मंडपात तीन नंदी ठेवलेले आहेत. मंडपाचे छत मुख्य अशा चार खांबांवर व भिंतीवरील अर्ध स्तंभावर नऊ भागात विभागलेले आहे.स्तंभ मध्याच्या खालच्या भागावर विविध आकृती कोरलेल्या आहेत. यापैकी अंतराळाकडे जे दोन स्तंभ येतात यावर कीचक आकृती कोरलेली आहे. पैकी एक स्त्री चतुर्भुज आहे व एक अंकुश व मोदक वगैरे हाती घेतलेला चतुर्भुज गणेश आहे. अंतराळातून गाभाऱ्याकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूस समोरासमोरील दोन्ही बाजूस कोष्टकामध्ये कोरलेल्या देव गणेश व कुबेर या देवतांच्या प्रतिमा दिसतात.
 
 
 
 
 
   गाभार्‍याच्या दारावरील शाखांवर प्रतिहरी, मांगल्य, विहग व घट्टपल्लव वगैरे आढळतात. गाभारा सभामंडपापेक्षा चार फूट खोल आहे. तीन पायऱ्या उतरून गेल्यावर गाभार्‍यात स्थायिक असलेली शिवपिंडी नजरेत दिसते. मानवास आदि मध्य आणि अंताचे ज्ञान देणारा हा ईश्वर पाहिल्यावर ब्रम्हांड दर्शन होते. आणि साकेश्वराच्या मंदिराचे सुरेख नक्षीकाम बघितल्यावर माणसाच्या कल्पकतेची जाणीव होऊन जाते. त्यावर पडलेल्या आघातांमुळे क्षीण झालेल्या देव प्रतिमांकडे पाहिल्यावर आम्हाला आमच्यातील देव अन् दानव दोन्ही दिसू लागतो…!
 
Sculpted Beauty
 
Ancient Indian Workmanship
 
Hallmark of Ancient India
One Rock Structure
Rear End of the Temple
    मंदिराची बाह्यभिंत खुपच साधी आहे. भौमितीक नक्षिकामाचा एकच पट्टा संपूर्ण मंदिराच्या तिन्हीबाजूंच्या भिंतीवर आहे. गर्भग्रुहाच्या भिंतीवर बाहेरुन तीनही बाजुंना देवकोष्ठ आहेत. या देवकोष्ठांमधील नटराज शिव, महिषासुरमर्दिनी अशा देवतांच्या मूर्ती आहेत मात्र सध्या या मूर्तींची अवस्था फारच खराब आहे.
     मंदिरात गावक-यांनी अजुनही विजेचे कनेक्शन घेतलेले नाही त्यामुळे मंदिरात कायमच अंधार असतो. मंदिर आतुनही खुपच साधे आहे. मंडपातील रंगशीळेच्या कोप-यावरील चार खांब मात्र खुप कोरीव काम असलेले आहेत. प्रत्येक स्तंभावर घटपल्लव व भारवाहक किचक आहेत. एका खांबावर गणपती भारवाहक यक्षाच्या रुपात आहे. मंदिरचा मंडप नवरंग या प्रकारात मोडतो. मंदिराचे मध्यभागावरील म्हणजे रंगशिळेवरील छत ही खुपच सुंदर कोरीव काम असलेले आहे.
    हे मंदिर एकदा पहायलाच हवे व या मंदिराच्या सोबतच विदर्भातली कोथळी, बार्शी टाकळी, सातगांव व लोणार अशी बुलढाण्यातील इतर ठिकाणेही बघता येतील. चिखलीमधे गांव मोठे असल्याने रहाण्याची सोय होउ शकते.
    हे मंदीर आणि सातगाव येथील विष्णु मंदीर हो दोन्ही मंदीरे त्यांच्या शिल्पाच्या आणि स्थापत्याच्या शैलीवरुन इ.स. १३ व्या शतकाच्या पुर्वार्धात बांधली असावीत.  याच काळात कोथळी, सातगाव, धोत्रा नंदई येथील मंदिरांचे बांधकाम झाले आहे़  मंदिराचे शिखर उंच आहे़.  मंदिराच्या शिखरावर असलेल्या शिल्पपटात ब्रम्ह, सरस्वती, महादेव- पार्वती व विष्णु- लक्ष्मीच्या प्रतिमा आहेत. तसेच महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमाही आहेत.  या मंदिराला २०१६ साली कुंपण घालण्यात आले. गावातील भाविक नियमित येथे येवून दर्शन घेतात़  मंदिर पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी होेते़.

संदर्भ :-

१) बुलढाणा जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३) https://www.lokmat.com
४) https://zerobeyond.com/
५) https://faktitihas.wordpress.com
६) https://www.misalpav.com

 

 





 

 

 

CHIKHALI SHIV MANDIR, INDIA

In a small village of Sakegaon, Chikhali Taluka in Buldhana district of Maharashtra, India is located one of the most neglected ancient Shiva Temples. Believed to be a 12th Century structure, this beautiful temple should have been included in the UNESCO heritage structure.

Sculpted Beauty

The temple is nearly 17 km away from the main Chikhali city and 25 km away Buldhana. It is very sad that there is absolutely no historical records whatsoever about this magnificent and beautiful Shiv mandir.

Ancient Indian Workmanship

Unlike other major temples of India, Chikhali Shiv Mandir, as it is popularly known is worshipped by only a few hundred plus villagers of Sakegaon. Villagers believe the temple has been there since centuries. Even though the site bears an ASI – Archaeological Survey of India board, there is no data available on the ASI website.

Glorious Past

The temple is believed to have been built during the reign of Prime Minister Hemadri Pandit during his tenure from 1259 to 1271. Hemadri Pandit was the Prime Minister during the King Mahadev’s regimes and King Ramachandra of Seuna Yādav Dynasty of Devagiri, who ruled the Western and Southern part of India during 1259 to 1274 and 1271 to 1309 periods respectively.

Hallmark of Ancient India

Popularly known as Hemadpant, Hemadri Pandit was a noted polymath, diplomat, an administrator, an architect, a poet, and a theologian and scholar. As an architect he introduced an architecture style, which became popular as ‘Hemadpanti Architecture’. He introduced Hemadpanti Sculpture in India like this amazing temple. Hemadpanti architecture does not use lime as the binding materials.

Frontal View

Chikhali Shiv Mandir is also a one rock structure like the renowned ancient most Shiv Mandir of Ambernath, India. One cannot find a single joint in the main temple structure of Chikhali Shiv Mandir. It is the beautiful workmanships of ancient Indian sculptors to create such an architectural masterpiece.

Hemadpanti Architecture

Author Keshav Appa Padhye had written Hemadri Pandit’s biography in Sanskrit. He had mentioned Hemadri as a Deshastha Rigvedi of Ashvalayana sutra and Vatsagotri, belonging to the Vatsa Gotra, Panchapravari brāhmaṇa. In the biography, the author Keshav Appa Padhye had taken the reference from Hemadri Pandit’s authored book titled चतुर्वर्गचिंतामणि”.

One Rock Structure

Hemadri Pandit was born to Kamadeo, a Deshastha Rigvedi Brahmin by birth, in a small village in the southern district of Karnataka. The region was under the Yadava Kingdom. However, Hemadri was brought in Maharashtra by his father.  

Entrance to Temple

The reference of Hemadpanti architecture style of Chikhali Shiv Mandir is taken from the ancient 1251 A. D Hemadpanti temple of Mahadev in Satgaon, Maharashtra. The architecture style of the pillars of the courtyard gateway and structural built is similar.

Rear End of the Temple

In India, Lord Shiva is worshipped all over the nation as the destroyer of ignorance spread all across the universe.

Temple Premise

Photographer: Johnny D

 https://zerobeyond.com/chikhali-shiv-mandir-india/

 

 





 

साकेश्वर मंदीर – साकेगाव


चिखलीपासून पश्चिमेस सहा मैलांवर एका छोट्या खेड्यात साकेगाव येथे हे साकेश्वराचे एक अप्रतिम मंदिर पाहिले की दक्षिणेत आल्याचा भास होतो !
एकेकाळी या मंदिराचा विमानाचा भाग पडला होता तो पुरातत्व खात्याने पुनश्च जसाच्या तसा दगडामध्ये बांधून काढला. आता त्याच्या या सुंदर शिखरावरील नक्षीकाम आपणास बघावयास मिळतो.
मंदिराचे शिखर भव्य आणि उंच असून नक्षीदार आहे. त्यावर अनेक लहान-लहान मंदिराच्या शिखर आकृती कोरलेल्या आहेत.
शुक्र नाशिकवर दर्शनी बाजूस भूज नटेश असून त्याच्या खाली तीन शिल्पपटात अनुक्रमे ब्रह्मा-सरस्वती शिवपार्वती व विष्णुलक्ष्मी आहेत तसेच दक्षिणोत्तर भागावर सरस्वती इंद्र व महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमा आहेत.
हे मंदिर गाभारा, अंतराळ, गूढमंडप व मुख मंडप युक्त आहे.
सध्या मंदिराच्या मुख मंडपात तीन नंदी ठेवलेले आहेत. मंडपाचे छत मुख्य अशा चार खांबांवर व भिंतीवरील अर्ध स्तंभावर नऊ भागात विभागलेले आहे.
स्तंभ मध्याच्या खालच्या भागावर विविध आकृती कोरलेल्या आहेत. यापैकी अंतराळाकडे जे दोन स्तंभ येतात यावर कीचक आकृती कोरलेली आहे. पैकी एक स्त्री चतुर्भुज आहे व एक अंकुश व मोदक वगैरे हाती घेतलेला चतुर्भुज गणेश आहे. अंतराळातून गाभाऱ्याकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूस समोरासमोरील दोन्ही बाजूस कोष्टकामध्ये कोरलेल्या देव गणेश व कुबेर या देवतांच्या प्रतिमा दिसतात.
गाभार्‍याच्या दारावरील शाखांवर प्रतिहरी, मांगल्य, विहग व घट्टपल्लव वगैरे आढळतात.
गाभारा सभामंडपापेक्षा चार फूट खोल आहे. तीन पायऱ्या उतरून गेल्यावर गाभार्‍यात स्थायिक असलेली शिवपिंडी नजरेत दिसते. मानवास आदि मध्य आणि अंताचे ज्ञान देणारा हा ईश्वर पाहिल्यावर ब्रम्हांड दर्शन होते. आणि साकेश्वराच्या मंदिराचे सुरेख नक्षीकाम बघितल्यावर माणसाच्या कल्पकतेची जाणीव होऊन जाते. त्यावर पडलेल्या आघातांमुळे क्षीण झालेल्या देव प्रतिमांकडे पाहिल्यावर आम्हाला आमच्यातील देव अन् दानव दोन्ही दिसू लागतो…!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

    https://faktitihas.wordpress.com/page/4/

 

साकेश्वर मंदीर – साकेगाव

चिखलीपासून पश्चिमेस सहा मैलांवर एका छोट्या खेड्यात साकेगाव येथे हे साकेश्वराचे एक अप्रतिम मंदिर पाहिले की दक्षिणेत आल्याचा भास होतो !
एकेकाळी या मंदिराचा विमानाचा भाग पडला होता तो पुरातत्व खात्याने पुनश्च जसाच्या तसा दगडामध्ये बांधून काढला. आता त्याच्या या सुंदर शिखरावरील नक्षीकाम आपणास बघावयास मिळते. हे मंदिर यादवांच्या काळातील असावे असे वाटते, पण राष्ट्रकूट आणि चालुक्यांची ही राजवट विदर्भात होती म्हणून नक्की काही सांगता येत नाही. असो,
मंदिराचे शिखर भव्य आणि उंच असून नक्षीदार आहे. त्यावर अनेक लहान-लहान मंदिराच्या शिखर आकृती कोरलेल्या आहेत.

शुक्र नाशिकवर दर्शनी बाजूस भूज नटेश असून त्याच्या खाली तीन शिल्पपटात अनुक्रमे ब्रह्मा-सरस्वती शिवपार्वती व विष्णुलक्ष्मी आहेत तसेच दक्षिणोत्तर भागावर सरस्वती इंद्र व महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमा आहेत.
हे मंदिर गाभारा, अंतराळ, गूढमंडप व मुख मंडप युक्त आहे.
सध्या मंदिराच्या मुख मंडपात तीन नंदी ठेवलेले आहेत. मंडपाचे छत मुख्य अशा चार खांबांवर व भिंतीवरील अर्ध स्तंभावर नऊ भागात विभागलेले आहे.
स्तंभ मध्याच्या खालच्या भागावर विविध आकृती कोरलेल्या आहेत. यापैकी अंतराळाकडे जे दोन स्तंभ येतात यावर कीचक आकृती कोरलेली आहे. पैकी एक स्त्री चतुर्भुज आहे व एक अंकुश व मोदक वगैरे हाती घेतलेला चतुर्भुज गणेश आहे. अंतराळातून गाभाऱ्याकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूस समोरासमोरील दोन्ही बाजूस कोष्टकामध्ये  कोरलेल्या देव गणेश व कुबेर या देवतांच्या प्रतिमा दिसतात.

गाभार्‍याच्या दारावरील शाखांवर प्रतिहरी, मांगल्य, विहग व घट्टपल्लव वगैरे आढळतात.
गाभारा सभामंडपापेक्षा चार फूट खोल आहे. तीन पायऱ्या उतरून गेल्यावर गाभार्‍यात स्थायिक असलेली शिवपिंडी नजरेत दिसते. मानवास आदि मध्य आणि अंताचे ज्ञान देणारा हा ईश्वर पाहिल्यावर ब्रम्हांड दर्शन होते. आणि साकेश्वराच्या मंदिराचे सुरेख नक्षीकाम बघितल्यावर माणसाच्या कल्पकतेची जाणीव होऊन जाते. त्यावर पडलेल्या आघातांमुळे क्षीण झालेल्या देव प्रतिमांकडे पाहिल्यावर आम्हाला आमच्यातील देव अन् दानव दोन्ही दिसू लागतो…!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।

https://faktitihas.wordpress.com/page/5/

 साकेगाव येथे मध्ययुगातील बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले दगडाचे मंदिर आहे़ परिसरातील ग्रामस्थांचे दैवत असलेल्या या मंदिरावर चहुबाहुने उत्कृष्ट शिल्प व मूर्ती कोरलेल्या आहेत़. आतमध्ये महादेवाची पिंड असून, मूर्तीच्या चहुबाजुने देवी, देवतांच्या मूर्ती आहेत़  या मंदिरालगत आणखी एक छोटे मंदिरही आहे़ तसेच मंदिरासमोर एक गध्धेगळ आहे़ तसेच यावर एक शिलालेखही असून, त्याचे वाचन होणे गरजेचे आहे़.    

    हे शिवमंदिर पुर्वाभत्रमुख असून, मुखमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह आहे़  मंदिराच्या गर्भगृहावरील शिखर बरेच मोठे असून यावर  मूर्ती कोरल्या आहेत़ मंंदिरामध्ये प्रवेश करण्याकरिता दगडी खांबांचे प्रवेशव्दार होते़  त्याची आता पडझड झाली आहे़.  या खाबांवरील छत पडले आहे़.  या व्दारातून आतमध्ये प्रवेश केल्यावर मुख्य मंदिराचे व्दार आहे़.  या मंदिराचे बांधकाम साधारणता बाराव्या शतकात झाले असावे़  याच काळात कोथळी, सातगाव, धोत्रा नंदई येथील मंदिरांचे बांधकाम झाले आहे़  मंदिराचे शिखर उंच आहे़.  मंदिराच्या शिखरावर असलेल्या शिल्पपटात ब्रम्ह, सरस्वती, महादेव- पार्वती व विष्णु- लक्ष्मीच्या प्रतिमा आहेत. तसेच महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमाही आहेत.  या मंदिराला २०१६ साली कुंपण घालण्यात आले. गावातील भाविक नियमित येथे येवून दर्शन घेतात़  मंदिर पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी होेते़.

https://www.misalpav.com/node/36144

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीपासून अंदाजे १०/१२ कि.मी अंतरावर सातगांव आणि साकेगांव ही दोन अप्रतिम प्राचीन मंदिरे असलेली गावे आहेत. आज आपण त्यातल्या साकेगांवचे साकेश्वर मंदिर बघु.


साकेगांवाच्या पश्चिमेला गावाबाहेर एका टेकडीच्या पायथ्याजवळ हे मंदिर उभे आहे. मंदिराच्या आजुबाजुला स्थानिक शेतक-यांची शेते आहेत. मंदिर शंकराचे असुन एका मोठ्या प्रांगणात आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मंदिराचा मुखमंडप, मंडप, अंतराळ व गर्भग्रुह असा प्लॅन आहे. मंदिराचा मंडप बंदिस्त असल्याने या मंडपाला आपण गुढमंडप असे म्हणु शकतो. मंदिर व मंदिराचे शिखर हे काळ्या पाषाणात बांधलेले असुन मंदिर गुढमंडपामुळे बंदिस्त दिसते.
या मंदिराचे सर्व सौंदर्य या मंदिराच्या कळसात एकवटले आहे. या शिखराचे अमलकापर्यंतचे सर्व भाग अजुनही व्यवस्थित जागेवरच आहेत. भूमिज शैलीचे इतके सुंदर व शाबुत (Intact) अवस्थेतले शिखर बघायला मिळणे हा फारच दुर्मिळ योग आहे. गर्भग्रुहावरील शिखर व त्याला जोडुन असलेल्या अंतराळावर या शिखराच्या शुकनासिकेचा भाग असुन त्या मधे समोरच्या व दोन्ही बाजूंवर तीन तीन स्तरांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मुखमंडपावर फांसणा शैलीसारखे शिखर आहे तर मंदिराच्या मंडपावर शिखर नाही व मंडपाचे छत वरुन सपाट आहे. मंदिराचे शिखर पुर्वी कधीतरी पडलेले होते पण ब्रिटीश राजवटीच्या काळात या मंदिराच्या कळसाची मंदिर परिसरातच पडलेले अवशेष वापरुन डागडुजी करण्यात आली. ही डागडुजी इतकी उत्तम पध्दतीने करण्यात आली की कधीकाळी मंदिराचे शिखर पडले होते व ते पुन्हा बांधण्यात आले असावे याची पुसटशी शंकाही आज आपल्याला येत नाही. मात्र Henry Cousins यांच्या Medieval Temples of Deccan या १९३१ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथात वापरलेल्या फोटोंमध्ये या मंदिराचे शिखर पडलेले आहे.


मंदिराची बाह्यभिंत खुपच साधी आहे. भौमितीक नक्षिकामाचा एकच पट्टा संपूर्ण मंदिराच्या तिन्हीबाजूंच्या भिंतीवर आहे. गर्भग्रुहाच्या भिंतीवर बाहेरुन तीनही बाजुंना देवकोष्ठ आहेत. या देवकोष्ठांमधील नटराज शिव, महिषासुरमर्दिनी अशा देवतांच्या मूर्ती आहेत मात्र सध्या या मूर्तींची अवस्था फारच खराब आहे.


मंदिरात गावक-यांनी अजुनही विजेचे कनेक्शन घेतलेले नाही त्यामुळे मंदिरात कायमच अंधार असतो.
मंदिर आतुनही खुपच साधे आहे. मंडपातील रंगशीळेच्या कोप-यावरील चार खांब मात्र खुप कोरीव काम असलेले आहेत. प्रत्येक स्तंभावर घटपल्लव व भारवाहक किचक आहेत. एका खांबावर गणपती भारवाहक यक्षाच्या रुपात आहे. मंदिरचा मंडप नवरंग या प्रकारात मोडतो. मंदिराचे मध्यभागावरील म्हणजे रंगशिळेवरील छत ही खुपच सुंदर कोरीव काम असलेले आहे.



हे मंदिर एकदा पहायलाच हवे व या मंदिराच्या सोबतच विदर्भातली कोथळी, बार्शी टाकळी, सातगांव व लोणार अशी बुलढाण्यातील इतर ठिकाणेही बघता येतील. चिखलीमधे गांव मोठे असल्याने रहाण्याची सोय होउ शकते.

 

 

 

 

 

मुखमंडप आणि मंडपाच्या मध्यभागाला घुमटाकार छत आहे. मंडपाच्या छताच्या उर्वरित भागाना प्रत्येक स्तरावरील तुळ्या छेदतात अशी रचना आहे. स्तंभाची रचना किंवा प्रकार सातगाव येथील मंदीरासारखाच असून चौरस तळखडा, त्यावर सपाट खांब, त्यवर उदगमासारखा घटक, अष्टकोनी घटक, पुर्णकलश, कुंभशीर्ष आणि त्यावर कीचकहस्त असे त्याचे स्वरुप आहे. जे स्तंभ मंदीराच्या महत्वाच्या जागेवर त्या स्तंभावर पुर्णकलश दिसतात. तर जे स्तंभ तुलनेने दुय्यम स्थानी आहेत, त्या स्तंभावर अष्टकोनी किंवा चौरस पट्ट दिसून येतात.
   मंदीराचा सर्वाधिक उल्लेखनीय भाग म्हणजे शुकनास किंवा गर्भगृहावरील भुमिज शिखर होय, शुकनास सातगाव येथील भुमिज विष्णु मंदीराप्रमाणे दुमजली असून तीच्या तळाशी हत्ती दाखवले आहेत.  शुकनासेच्या दर्शनी भागात तिहेरी कमान असून हि कमान कीर्तिमुखाच्या तोंडातून बाहेर पडल्याचे दाखवले आहे. या कमानीच्या खालच्या तीन पट्टामध्ये ब्रम्हदेव, विष्णु आणि महेश आहेत. आणि मुख्य कमानीच्या मधोमध ध्यानस्थ बसलेला महेश दाखवला आहे. शुकनासेचा बर्याच भागाचा जीर्णोध्दार झालेला आहे. शुकनासेच्या प्रत्येक बाजुवर तीन लहान देवळे असून एकंदरीत सहा स्तंभकुट आहेत.
  हे मंदीर आणि सातगाव येथील विष्णु मंदीर हो दोन्ही मंदीरे त्यांच्या शिल्पाच्या आणि स्थापत्याच्या शैलीवरुन इ.स. १३ व्या शतकाच्या पुर्वार्धात बांधली असावीत. 


 साकेगाव चा साकेश्वर

 *साकेगावचा साकेश्वर खुणवतोय!*

वेदकाळात उपासना व पूजन हा भक्तीमार्ग यज्ञ याग विधि च्या माध्यमातून होत असे , वेद आणि ब्राम्हण ग्रंथामधे विविध यज्ञीय क्रियांचा उल्लेख मिळतो .वेदकाळानंतर प्रचलित  यज्ञरूपी भक्तीमार्ग देवप्रतिकांची उपासना करण्यात परावर्तीत होत गेल्याचे दिसते .देवतांच्या पाषाण अथवा धातुच्या साकार झालेल्या मूर्ती पूजा प्रचलित झाली .या देवप्रतिमासोबत देवालय निर्माणचा उल्लेख अर्थर्ववेदात येतो .मूर्तिपूजनाचे प्रमाणरुप सिंधू संस्कृतीच्या काळातही दिसते .माता,पशूपतीनाथ,योनी,वृक्ष,शिवलिंग यांना पवित्र मानले जायचे .वेदातही शिवाला पशूपतीनाथ हा उल्लेख वारंवार येतो .

 भारताच्या पूर्व भागात शिव -रूद्र उपासनेचे विशेष महत्व आहे .तेवढेच महत्व आपल्या महाराष्ट्रातही दिसते . अगदी गुप्त काळापासून शिल्पकौशल्यावर आधारीत अनेक सुंदर शिव मंदीराचे निर्माण झाले .मराठवाडा तसेच विदर्भातही असे अनेक मंदिरे आहे .विदर्भातील मार्केण्डय मंदिर वगळता सर्व मंदिरे काळ्या दगडात बांधलेली आढळतात .त्यापैकीच एक साकेगावचे साकेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आजही दिमाखदारपणे उभे आहे .चिखली वरून धाड कडे जातांना सहा -सात किलोमिटर अंतरावर, बुलढाणा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर  एका डोंगराच्या पराड्यात मुख्य रस्त्यावरूनच या मंदिराचे मोहक रूपाचे दर्शन घडते .बुलढाणा जिल्यात लोणार, धोत्रानंदई,मढ,सातगाव(विष्णु मंदिर)कोथळी येथे  या प्रकारची मंदिरे आहेत . मंदिराला प्राचीन काळी संपुर्ण तटबंदी असल्याचे दिसते .तटबंदीला एक प्रवेशद्वार आहे . दगडी शिळा पासून तयार केलेलं सुंदर असं गोपूर आपल्याला दिसते. या गोपुराच्या उंबरठ्यावर आपल्याला दोन कीर्ती मुखे कोरलेली दिसतात. या कीर्तीमुखां बाबत पुराण कथेमध्ये असे सांगितले जाते की, येणाऱ्या भाविकांचे पाप खाण्यासाठी याची रचना शिवाने मंदिरावर केली आहे .हे कीर्तीमुख म्हणजे राक्षस आणि त्या राक्षसाची भूक एवढी होती की त्याने त्याचं संपूर्ण शरीर खाऊन घेतल्यावरही ती भागली नाही म्हणून शिवाने त्याला वरदान दिले आपल्या मंदिरावर त्याला जागा देऊन त्या ठिकाणी भक्तीसाठी येणाऱ्या भाविकांचे पापे खाण्याचे काम त्याच्याकडे दिलं अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून मंदिरावर याचे निर्माण केल्या जाऊ लागलं. मंदिराला नंदीमंडप ,गूढमंडप व गाभारा असे भाग आहेत .

नंदीमंडपात तीन नंदीशिल्प आहेत . मंदिरात आत प्रवेश करताना दगडी द्वाराच्या वर गणेश शिल्प कोरलेले आहे संपूर्ण द्वारावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. आत प्रवेश करताच आपल्याला मंदिरातील कला शिल्पांचा अप्रतिम भाग नजरेच्या समोर येतो. आजही तो शाबूत आहे. सभामंडपाचे छत चार मुख्य खांबावर आधारलेले आहे.अंतराळातील दोन स्तभावर एक स्त्री चर्तुभूज असून चर्तुभूज गणेश विराजमान आहेत . सभा मंडपाचे खांब भार वाहक यक्षाने तोलून धरलेले आहे. मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अन्वा येथील शिव मंदिरात ज्याप्रमाणे गणपती हा भार वाहकाचे काम करतो तसेच या मंदिरातही भारवाहक गणेशाचे सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळते. याशिवाय खांबाच्या अगदी तळाशी देखील गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. छतावर सुंदर नक्षीकाम केलेले असून दगडी गोल झुंबर वर कोरलेले आहे सभामंडपापेक्षा चार फुट खोल गाभारा आहे. गाभाऱ्यात उतरण्या अगोदर डाव्या आणि उजव्या बाजूला देव कोष्टकामध्ये गणेश व कुबेराची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या दारावर प्रतिहारी,मागल्यविहग,घटपल्लव आहेत . गाभाऱ्याच्या मुख्य द्वारावर अगदी मधोमध गणेशाची मूर्तीही आपल्याला दिसते. पाप खाणारी कीर्तीमुखे सुद्धा याद्वारावर आहेत. याचा अर्थ गाभाऱ्यापर्यंत पोहोचताना ही कीर्तीमुखे माणसाला त्याची पापे खाऊन पुण्यवान बनवून शिवलिंगापर्यंत पोहोचविण्याची रचना प्राचीन मान्यतेनुसार असावी. गाभाऱ्यात पूर्ण चंद्राकार शिवलिंग प्रतिष्टापित केलेले आहे. मंदिराचा अंतर्भाग जेवढा मनमोहक आहे तेवढाच तो बाह्य भागही आपल्याला आकर्षित करून घेतल्याशिवाय राहत नाही.  मंदिराची मुख्य गाभार्‍यावरील कळसाची रचना ही हुबेहूब अमृतेश्वराच्या मंदिरासारखीच भासते. नागरशैलीतील ही रचना असलेलं  शिखरी शिखर प्रकारातील आहे .त्यावर विविध लता आमल काच्या खालील भागात कोरलेल्या आहेत. शिखरावर आधारभूत अशी छोटी छोटी शिखरे आपल्याला भासतात. कळसावरील सुंदर नक्षीकाम आजही मनमोहक आहे .त्याकाळातील प्रगत शिल्पकलेची साक्ष देत ते आजही उभे आहे . मंदिराच्या वरील भागात ब्रम्हा,शिव पार्वती ,महिषासूरमर्दिनीचे शिल्प आहेत.एका भागात कुस्तीचा प्रसंग आहे .गाभाऱ्याच्या बाह्य भागावर पाठीमागील शिवाची तांडवमुद्रेतील शिल्प आहेत . देव कोष्टात तयार केलेल्या मूर्ती शिल्पाचा दगड हा मंदिरात वापरलेल्या दगडापेक्षा थोडा वेगळा वाटतो. आपण प्राचीन मंदिरांना भेट देतो .त्या मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतो मंदिर निर्माण हे केवळ एवढ्या गोष्टीसाठी नसून यामागे एक गुढ असा अर्थ दडलेला असतो. थोडक्यात मंदिरावर निर्माण केल्या गेलेल्या प्रत्येक शिल्पाचा  अर्थ असतो. मंदिरावर घडविण्यात आलेल्या छोट्याशा कलाकृतीतही फार मोठा अर्थ दडलेला असतो यासाठी त्याचा अर्थ बोधन होणं आवश्यक आहे आणि हे अर्थबोधन अभ्यासातूनच साध्य करता येते. प्राचीन मंदिरे व मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बा. देगलूरकर यांच्या अभ्यासातून त्यांनी हे सिद्ध केलंय . ते म्हणतात

आपण वेरूळच्या कैलास लेणीत गेल्यास एक शिल्प अवश्य बघावं. आपण कोणत्याही प्राचीन मंदिरात मूर्ती पाहिल्यावर ती आपल्याला अर्धीच कळत असते मूर्तीच्या संपूर्ण अंतरंगात गेलो तर मूर्तीचा उलगडा होत असतो. यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सामाजिक बाबी असतात त्या आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला मूर्तीचे स्वरूप कळते.  पार्वती साधना करतांनाचे  शिल्प आहे मग ती ही साधना किंवा तपश्चर्या कशासाठी करत आहे यासाठी आपल्याला पुराणाच्या गोष्टीकडे वळावे लागते. मग लक्षात येते की शिवासाठी ती या ठिकाणी तप करत आहे. हे या मूर्तीवरून या ठिकाणी कळते इथपर्यंत ठीक आहे पण ही पार्वती कोण आहे? पती, पशु,पाश या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी  यामध्ये  दिसतात .पती हा शिव आहे. पाश म्हणजे हे सर्व प्राणी आहेत पार्वती हा जीव आहे आणि तो पती करता या ठिकाणी तपश्चर्या करतो आहे. म्हणजे जीव हा शिवा करिता तपश्चर्या करत आहे. हे या मूर्तीतून कळते हे या मूर्तीचा अर्थ बोधन आहे. "कल्याण सुंदर मूर्ती "शिवपार्वतीचा विवाह दाखवणारी मूर्ती ही पुढची मूर्ती या लेण्यांमध्ये आपल्याला दिसते. पार्वती शिवाचा हात हातात घेतलेला आहे, वास्तविक पाहता शिवाने पार्वतीचा हात हातात घेणे अपेक्षित आहे पार्वती शिवाकरिता तप करते मग तिला शिवाची प्राप्ती झाली. याच्यापुढे बघितल्यास आपल्याला अर्धनारी श्वराची मूर्ती दिसते. तप, प्राप्ती ,विवाह या तीन अवस्था या शिल्पामधून आपल्याला दिसल्या. म्हणजे "जीवाला शिवाची" प्राप्ती झाली आणि त्यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली आणि त्याचे पुढचे शिल्प जे आहे ते  अर्धनारीश्वराचं म्हणजे

  "जीव ब्रह्मा एवं ना पर: " 

या तीनही मूर्तीचा बोध अशा प्रकारे आपल्याला घ्यावा लागतो या मूर्ती स्वतंत्रपणे घेतल्या तर त्याचा वेगळा अर्थ निघतो फक्त अर्धनारीश्वराची मूर्ती म्हणजे " प्रकृती आणि पुरुष" यांचे एकत्रीकरण हे सांख्यदर्शन यामध्ये आपल्याला दिसते.

   इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे पार्वती ही पर्वत कन्या ती निश्चयी तसेच कठोर हृदय असते. तिचा निश्चय हा तिच्या श्रद्धेचा मापदंड आहे. तिला शिव हवा आहे. तिला त्याने आपले डोळे उघडायला हवे आहेत त्यांनी तिला प्रेमालिंगन द्यावे आणि विश्वाची मैत्री करावी असे तिला वाटते. इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे अनेक असुर, देव व मार्कंडे यासारखे ऋषी तपचर्या करतात आणि ईश्वराला प्रसन्न करतात ते त्यांच्या स्वतःसाठी लाभदायक ठरतील असे वर मागतात परंतु पार्वती इतरांचे कल्याण होईल असा वर शिवाकडे मागते. तिला शिव हवा आहे तो केवळ तिच्या वैयक्तिक सुखासाठी नसून साऱ्या विश्वाला लाभदायक ठरावा म्हणून हवा आहे तिच्या साधने पासून शिवची दर्याद्र बुद्धी आणि त्याच्या मनातील कणव जागृत व्हावी म्हणून ती निकराचे प्रयत्न करते. शिव नसेल तर सारे जिवंत प्राणिमात्र निसर्गाशीच जखडले जातात ,पण तो त्यांना त्यातून मुक्त करू शकेल गुरुत्वाकर्षणामुळे ते अडकलेले आहेत तो त्यांना त्यांच्या कृपादृष्टीने त्यातून सोडवू शकेल. 

           याशिवाय त्यांनी शिवाच्या चतुष्पाद सदाशिव या शिवाच्या चार पाय असलेल्या मूर्ती बाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे ही मूर्ती गडचिरोली येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरात आढळते बहुदा चार पाय असलेली शिव शंकराची मूर्ती नसते .मूर्ती आपण बघितल्यास दोन पाय खाली सोडलेले असून दोन पायांनी मांडी घातलेली आहे. डॉ. देगलूरकरांनी हे चार पाय आपल्याला शैव सिद्धांताकडे नेतात असे म्हटले आहे कारण शैव सिद्धांत चार प्रमेयावर  उभा आहे. ही चार प्रमेय म्हणजे चर्यापाद, क्रियापाद, ज्ञानपाद, व योगपाद होय. या सिद्धांतानुसार त्याचा अर्थ लावावा लागतों. सदाशिव स्वरूपातील या मुर्त्या खजुराहो येथे दोन आहेत आणि मार्कंडेश्वर येथे एक आहे असे सांगितले जाते. इतर अभ्यासकांनीही या मूर्तीचा अर्थ लावलेला दिसतो या स्वरूपातील शिव चतुष्पाद असणे म्हणजे शिवाचे अस्तित्व आणि प्रभाव सत्य, द्वापर, त्रेता आणि कली या चारही युगात आहे. त्यांचा प्रत्येक पाय एकेका युगाशी संबंधित आहे. अभ्यासकांच्या नजरेतून अशा पद्धतीने या दोन शिल्पांचा अर्थ आपण पाहिला अशी अनेक शिल्पे मंदिरावर असतात या प्रत्येकाचा काही ना काही अर्थ असतो आज साकेश्वराच्या मंदिरावर अशी अनेक शिल्पे आहेत की, जी अभ्यासाच्या प्रतीक्षेत आहेत.बाहेर अस्ताव्यस्त शिळाही आहेत की ज्या आजही संशोधनाच्या प्रतिक्षेत आहेत.मंदिराच्या वरच्या भागात सिता नान्ही म्हणून एक छोटी बारवही आहे .या बारवेत जीवंत पाणी आढळते .या प्राचीन पाणवठयाला मात्र आता आधुनिक मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोत  अडथळा ठरत आहेत .

एक वेळ अवश्य या प्राचीन वास्तुस अवश्य भेट देऊन याचे जतन होण्यासंदर्भात आपले योगदान असू दया ! साकेश्वर आपल्याला खुणवतोय!        

https://shivjagars.blogspot.com/2023/09/blog-post_18.html

संजय खांडवे

बुलढाणा

९०११९७११२२








           

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...