Thursday, April 27, 2023

माणकेश्वर मंदिर

  महाराष्ट्रातील अगदी प्राचीन उत्तम शिल्पाविष्कारांनी नटलेली मंदिरे मोजायची झाल्यास एका हताची पाच बोटेही पुरेशी आहेत. अंबरनाथ बदलापुरचे शिवमंदिर, खिद्रापुरचे कोपेश्वर मंदिर, औंढ्याचे नागनाथ मंदिर, अन्व्याचे मंदिर आणि पाचवे नाव घ्यावे लागते ते माणकेश्वर (ता. परंडा  जि. उस्मानाबाद) च्या मंदिराचेच.हीच नावं का घ्यायची तर या मंदिरांच्या बाह्य भिंतींवरील (जंघा) अप्रतिम असा शिल्पाविष्कार. आणि दुसरं म्हणजे यांचे प्राचीनत्व. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले माणकेश्वर येथील महादेवाचे मंदिर खरंच एक मंदिर माणिक आहे. मराठवाड्यातील माणकेश्वर गावठाणामध्ये विविध ग्रामदैवतांची मंदिरे आहेत. ती उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम आणि परांडा या दोन तालुक्यांतील भौगोलिक प्रदेशात आढळतात. माणकेश्वरची निजामाच्या राजवटीचे शेवटचे टोक अशीही ओळख आहे.


  छ्त्रपती संभाजीनगर-धाराशिव रस्त्यावर कुंथलगिरीपासून उजव्या हाताच्या रस्त्याला वळलो की डोंगररांगांतून एक छानसा रस्ता जातो. टेकड्या हिरवळ तळे असा निसर्गसुंदर परिसर. या रस्त्याने भूम पर्यंत गेल्यावर तेथून ११ किमी दक्षिणेला माणकेश्वर गाव आहे. विश्वकर्मा नदीच्या चंद्राकृती वळणावरची नयनरम्य जागा शोधून या मंदिराची उभारणी केल्या गेली आहे. 
माणकेश्वर मंदीराचे ब्रिटीशकालीन चित्र

 इतिहासाचा धांडोळा घेता आपल्याला अणदूर शिलालेखात चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्याच्या मुलाने, मल्लिकार्जुन यांच्या या मंदिरास दान केल्याचे पुरावे सापडतात. स्थानिक लोक मंदिर ‘मल्लिकार्जुन मंदिर’ या नावाने ओळखतात, हा योगायोग नसावा. मंदिराच्या सभामंडपातील खांबावर असलेल्या शके ११४५ सालातील शिलालेखात आपल्याला यादव राजा सिंघन याने या मंदिराला दान दिल्याची नोंद सापडते. लेख त्रुटीत असल्याने पुढील माहिती कळत नाही. मंदिर व शिल्पांची शैली व ऐतिहासिक पुरावे बघता मंदिराची निर्मिती नक्कीच १२ व्या शतकात झाली असावी.अणदुरच्या शिलालेखात या मंदिराला अनुदान दिल्याचा संदर्भ सापडलेला आहे. त्यावरून याचा कालखंड १२ व्या शतकातला असल्याचे सिद्ध होते.
maratha riyasat
मराठा रियासत मधील संदर्भ
   
  इ स १६५९ मधे अफजल खान शिवाजी महाराजांचा पाडाव करण्याच्या उद्देशाने निघाला. विजापूर, सोलापूर, तुळजापूर, मानकेश्वर,करकंब, भोसे, पंढरपूर. रहिमतपूर मार्गाने वाईस गेला. जाताना वाटेत पडनार्या मंदीराची तोडफोड केली.त्या तोडफोड केलेल्या मंदिरात मानकेश्वर (mankeshwar mahadev mandir)मंदिराचा समावेश आहे.( संदर्भ - मराठी रियासत, भाग १ लेखक गो स सरदेसाई ) या मंदिराच्या बाह्य भागावर असलेल्या देवतांच्या व सुरसुंदरीचे शिल्पांची अफजल खान, मोगल आणि रझाकार यांनी भयंकर तोडफोड केली आहे. 
   कुठलेही शिल्प किंवा प्रतिमा पूर्ण अवस्थेत नाही.मंदिर परिसरात खूप सारे तोडलेले मंदिर अवशेष विखुरलेले आहेत. मंदिरा समोरच एक चौथरा आहे. या चौथर्यावर पुर्वी मंदिर असावे. मंदिराच्या परिसरात विखुरलेले अवशेष याच तोडलेल्या मंदिराचे असावेत.चौथर्यावर गणपती, दोन नंदी, नागदेवता, विरगळ यांचें भग्न अवशेष पडलेले आहेत.
 
    मंदिर त्रिदल पद्धतीचे (तीन गर्भगृह असलेले) आहे. ही पद्धत मराठवाड्यात मंदिर शैलीतील विकसित अशा कालखंडातील मानली जाते.  मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य मंदिरासमोर नंदी मंडपाचा गजथरयुक्त चौथरा आहे. मुखमंडपात बसण्यासाठी कक्षासने असून त्याच्या पाठच्या वामन भिंतींवर अर्ध स्तंभ व मानवी आकृती, गजथरयुक्त आहेत. मंदिरातील स्तंभ, मुख्यतः सभामंडपातील रंगशिळे भोवतीचे स्तंभ आकर्षक आहेत व त्याच्या पायथ्याशी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती कोरल्या आहेत.त्यातील वेणुगोपालची हातात कालिया नाग असलेली मूर्ती वेगळी आहे. स्तंभ व अर्धा स्तंभाचे स्तंभ शीर्ष भारवाहक किचकांचे आहेत व स्तंभ मध्यावर व्याल, देवता मूर्ती व प्राणी कोरलेले आहेत. गर्भगृहाची द्वारशाखा ७ शाखांची हस्तिनी प्रकारची ज्येष्ठद्वारा असून महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये दुर्मिळ आहे.
  माणकेश्वर हे एक शिवालय आहे.या मंदिराची प्रमुख देवता शिव म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात शिल्पे ही शिवाची अथवा त्याच्या अवताराची आढळून येतात.
एखादे मंदिर लांबुन ओळखू येण्यासाठी या शिल्पांची मदत होते.म्हणजे त्या शिल्पाने घातलेली वस्त्रे,त्याच्या हातातील आयुधे,अलंकार यांवरून त्या शिल्पाची ओळख होते.त्याच्या पायाशी असणाऱ्या वाहनावरूनही ते शिल्प कुठल्या देवदेवतेचे आहे,हे समजते.
        ज्या ठिकाणी देवाचे शिल्प असते,तेथे त्याच्या डोक्यावर एक छोटे कळस निर्माण केलेले असते आणि त्या शिल्पाच्या पायात त्याचे वाहन..!!त्यावरून नेमके देवाचे शिल्प आणि नृत्यांगना,यक्ष यांच्या शिल्पांची विभागनी करता येते.
     मंदिराचे बांधकाम हा एक अभ्यासपूर्ण विषय आहे.म्हणजे,मंदिराचा पाया किती असावा त्यावर किती मोठे मंदिर उभारता येईल,त्यात उभारलेल्या खांबावर कीचक आणि उलट्या नागाचे शिल्प का कोरलेले असते या सर्वांची उत्तरे काहीशी स्मितीत करणारी आहेत.म्हणजे,कीचक आणि नाग कितीही वजन पेलू शकतात म्हणून त्यांची निर्मिती खांबावर केलेली आढळते.
    मंदिर प्रवेश करताना वरच्या बाजूला निर्मिलेल्या यक्ष आणि किन्नरांच्या शिल्पांच्या मागे असणारे कारण म्हणजे आकाशातून पुष्पवृष्टी करणारे देवगण..!!
आत संभामंडप.त्यात या मंडपाचे छत किती भागात विभागले गेले आहे यावरून ते मंदिर कुठल्या प्रकारात बांधले आहे ते स्पष्ट होते.या मंदिराचे छत हे एकूण ९ भागात विभागले होते म्हणजे नक्षत्रप्रमाण..!!




Mankeshwar-min

मूळ मंदिर हे उंच पीठावर उभे आहे आणि त्या उंचीवरून मंदिराभोवती मंदिराच्या तलविन्यासाच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग तयार केलेला दिसतो. प्रदक्षिणा पथ मंदिराच्या तलविन्यासाप्रमाणे फिरतो व आपल्याला बाह्य अंगावरील मूर्ती बघता येतात. आज देवळाचे शिखर अस्तित्वात नाही ना त्याचा अंदाज येण्यासाठी खुणा शिल्लक आहेत. पाय-या चढून जाता मुख मंडप गूढ मंडप (भिंतींनी बंद असलेला), देवकोष्ठयुक्त अंतराळ व तीन गर्भगृह अशी रचना दृष्टीस पडते. मंदिराच्या मुखमंडपाच्या बाजूने बाहेर आलेले देवकोष्ठयुक्त अर्धस्तंभ ही महाराष्ट्रात कुठेही न आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण रचना होय! मुख मंडपात वामनभिंतीवर (अर्ध्या उंचीच्या) गजथर, मनुष्यकृती व शिखरयुक्त स्तंभाची रचना आहे आणि मागील बाजूने बसायला कक्षासने आहेत.  चार दिशेला दिशांचे स्वामी दिक्पाल इंद्र, वरूण, यम आणि कुबेर आपल्या वाहनांसोबत दिसतात. मंदिराचा बाह्यभाग अप्रतिम अशा सुरसुंदरींच्या शिल्पांनी व इतर देवतांच्या शिल्पांनी नटलेला आहे. 
   मंदिराच्या सभा मंडपाचा व गर्भगृहांचा तलविन्यास तारककृती असल्याने मूर्ती कोनात बसवल्या आहेत. उपपीठावरील उपान पट्टीवर देवता मूर्तीचे शिल्पांकन आहे. गर्भगृहावरील ३, सभा मंडपावरील २ व मुखमंडपाच्या बाजूची २ अशी एकूण ७ देवकोष्ठे आहेत; पण ती दुर्दैवाने रिकामी आहेत. सभामंडपाचे छत समतल असून कमलाकृती व मनुष्याकृती कोरल्या आहेत. मुख्य द्वारशाखा ७ शाखांची हस्तीनी प्रकारची आहे व शैव द्वारपाल, नदी देवता, प्रतिहारी पायापाशी कोरले आहेत. 

 
 
मंदिराच्या समोर एका मंडपाचा चौथरा दिसून येतो. त्यावरचा अप्रतिम असा गजथर अजूनही शाबुत आहे. पण बाकी मंडप कोसळलेला आहे. इथे सध्या एक नंदी ठेवलेला आढळतो. मंदिराला मकरप्रणाल (गाभार्‍यातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्याची जागा) आहे. त्यावर दोन निष्कर्ष निघतात. एक तर या मंदिराचा कालाखंड मध्ययुगाच्या मागे जातो. दुसरं म्हणजे हे शिव मंदिर नसून विष्णु मंदिर असण्याची जास्त शक्यता आहे. कारण शिवमंदिराला गोमुख असते. (अर्थात या सगळ्यांना अपवाद आहेत. यावर विविध तज्ज्ञांनी आपली मते नोंदवून ठेवली आहेत.)
 

 मंदिराच्या मुखमंडपातून आत शिरल्यावर मुख्यमंडप लागतो. त्याच्या मध्याशी चौकोनी अशी रंगशीळा आहे. या मंडपाला २० सुंदर स्तंभांनी तोलले आहे. यातील चार प्रमुख स्तंभांवर अप्रतिम असे कोरीवकाम आढळते. होयसळेश्वर मंदिरावर आढळून येणारे अतिशय बारीक असे कोरीवकाम या स्तंभांवर आहे. सोन्याच्या बांगड्यांवर ज्या पद्धतीने नक्षीकाम केलेले आजकाल दिसून येते त्याचे नमुने माणकेश्वर मंदिरावरच्या खांबांवर आढळून येतात. यातील  नक्षीकामात कोरलेले मणी तर इतके बारीक आणि सुंदर आहेत ते दगडाचे आहेत म्हणून नसता मोत्याचेच वाटावेत असे सुबक आणि सुंदर आहेत.मंदिरामधील रंगाशिलेभोवती चार स्तंभांवर नक्षीदार अलंकरण असून चौकोनी भागावर देवता मूर्ती आहेत, त्यात कालिया मर्दन, बन्सीधर कृष्ण व नंदिकेश्वरची शिल्पे बसवलेली आहेत. स्तंभांवरील मधल्या चौकटीत भैरव आचार्य योगी प्रतिमा आहेत. त्यावरील एका पट्टीवर यादव राजा सिंघन देवाचा लेख नागरी लिपीत कोरलेला आहे.


माणकेश्वर मंदिराचे सगळ्यात मोठे आणि वेगळेपण त्याच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेत आहे. डॉ. गो.ब.देगलुरकरांसारख्या अभ्यासकांने हे वेगळेपण नोंदवून ठेवले आहे. गर्भगृहाच्या चौकटीवर कोरीवकाम केलेली पट्टी असते. ही सहसा तीन किंवा चार या प्रमाणात असते. म्हणजे एक पट्टी फुलांची नक्षीची, त्यामागे दुसरी पट्टी पानांची, तिसरी पट्टी नृत्य करणार्‍या स्त्री पुरूषांची. पण हे एकमेव असे मंदिर महाराष्ट्रात आढळले आहे जिथे एक दोन नव्हे तर सात द्वारशाखा आहेत.
ललाटबिंबावर गणेश प्रतिमा आहे व मुख्य माणकेश्वराचे लिंग गर्भगृहात आहे. 



 

मराठवाड्यात, औंढा नागनाथ मंदिराखालोखाल सर्वात अधिक पूर्णाकृती शिल्पे महादेव मंदिराच्या बाह्यभागावर आढळतात. मंदिरावर बाह्य भागात एकूण १०९ सुंदर मुर्ती आहेत. आतील मुर्तींची संख्या गृहीत धरल्यास एकूण ३४७ मुर्ती अभ्यासकांनी नोंदवल्या आहेत.  त्यात अर्धस्तंभांच्या मध्ये सूरसुंदरी व देवता मूर्ती बसवल्या आहेत. वीणा वादन करणारी सरस्वती, बासरी वाजविणारा कृष्ण, मृदंग वाजविणारी सुंदरी, चतुर्भज दोन हातात घंटा असलेली नृत्य मुर्ती, तंतुवाद्य वाजविणारी सुंदरी, डमरुधारी शिव असे संगीतविषयक संदर्भ असलेली शिल्पे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जातात. केवल शिव, ऐरावतधारी इंद्र, ब्रह्मदेव, लक्ष्मी या मुर्तीही मंदिराचे वैशिष्ट्य आहे. हरिहर म्हणजेच विष्णु आणि शिव यांची संयुक्त मुर्ती. अशी मुर्ती माणकेश्वर मंदिरावर आढळून आली आहे. मर्दला, पुत्रवल्लभा, दर्पणा, पत्रलेखिका ह्या सूरसुंदरींबरोबर शिवाची विविध रूपे, महिषमर्दिनी, सरस्वतीची शिल्पे आहेत. लक्ष्मी, कौमारी, ब्राह्मणी, इंद्राणी इत्यादी मातृका आहेत.आठ दिशांचे आठ दिक्पाल अनुक्रमे कुबेर, ईशान, इंद्र, अग्नी, यम, निऋती, वरुण व वायू हे त्यांच्या वाहनांसोबत कोरले आहेत. मंदिरावरील दोन महिषमर्दिनी व दोन महिषासूरमर्दिनी या गतिशील आणि तेवढ्याच सुबक आहेत. शिवाचे भैरव स्वरूप, अंधकासुर वधमूर्ती, नटराज ही शिवाची विविध रूपे मंदिरावर अंकित आहेत. सरस्वती, चामुंडा, दुर्गा, ब्रह्मा, हरिहर, भैरव, बटू भैरव, गणपती, २४ प्रकारच्या विष्णुमूर्तीमधील काही शिल्पे अशी बरीच रेलचेल आहे.
मंदिराच्या बटूभैरव मूर्तीच्या हातात खटवांग (दंडावर मानवी कवटी) नावांचे आयुध दिसते व त्यातील खटवांगाच्या डोळ्याच्या खोबणीतून बाहेर आलेला साप दाखवला आहे. मर्दला, पुत्र वल्लभा, दर्पणा पत्रलेखिका, कर्पूरमंजिरी या चालुक्यांना प्रिय असलेल्या सूरसुंदरी मंदिरावर शिल्पांकित केल्या आहे. प्रदक्षिणा मार्गावर सुबक मकरप्रणाल एक कोनात कोरले आहे. इंद्राणी, ब्राह्मणी, वैष्णवी, करवीर निवासिनी महालक्ष्मी ही शक्तिरूपे मंदिराचे वेगळेपण आहे. मंदिर शिल्पे जरी काही प्रमाणात खंडित असली तरी मूर्तीचे शरीरसौष्ठव, प्रमाणबद्धता, वस्त्रांचे घोळ, दागिन्यांची नाजूक नक्षी व डौल हा वाखाणण्याजोगा आहे. बहुतेक मूर्ती त्रिभंग (तीन कोनात वळलेल्या) असून नृत्यमग्न आहेत, तर काही समभंग आहेत. 



मंदिराबाहेर मागच्या बाजूला एक शिल्प आहे.त्याला पूर्ण शेंदुर लावला आहे.(वरील चित्रात ते स्पष्ट दिसून येईल.)खरेतर ती एक लिखाण करणारी स्त्री आहे.तिच्या डोक्यावर कसलेही शिखर दिसत नाही आणि पायाशी कुठलेही वाहन नाही.म्हणजे ही देवयोनीमधे मोडत नाही. मग लिखाण करणारी स्त्री म्हणजे सरस्वती असा समज करुन त्या शिल्पाचे पार वाटोळे केले.खरेतर ११ व्या शतकात लिखाण करू शकणारी स्त्री म्हणजे आपल्या वैभवशाली इतिहासातील एक स्त्रीशिक्षणाचे प्रतीकच..!! तरीही पत्रलेखिकेचे हे शिल्प गेल्या कित्येक वर्षांपासून शेंदराच्या थराखाली झाकलेले होते. माणकेश्वर मंदिराच्या शेजारीच सटवाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनाला असंख्य भाविक येत असतात. सटवाई देवी लहान मुलांचे भविष्य पाटीवर लिहिते अशी अख्यायिका आहे. सटवाई देवी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या चालुक्यकालीन असलेले मंदिर ज्यावरुन या गावाचेही नाव पडले आहे, असे माणकेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पत्रलेखिकेचे शिल्प आहे. परंतु, या पत्रलेखिकेवर शेदराचा मोठ्या प्रमाणात थर चढला होता. 
   सटवाई देवीच्या अख्यायीकेशी साम्य दर्शविणारे लेखिकेचे हे शिल्प समजून लोकांनी त्यावर शेंदूर लावण्यास सुरवात केली. वर्षानुवर्षे शेंदूर लावला जात असल्याने मूर्तीवर जाड थर तयार झाला होता. त्यामुळे अक्षरशः मूर्तीचे मूळ स्वरुपही पूर्णपणे झाकले गेले. अखेरीस पुरातत्त्व विभाग आणि औरंगाबाद येथील अधिकारी मंदिराच्या पाहणीसाठी गेले असता, या प्रकारावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांची समजूत काढून आपल्या गावात असलेल्या या प्राचीन व अतिशय महत्त्वपूर्ण  वारशाप्रती जागरूक होण्याबाबत गावकऱ्यांना आव्हान केले. अधिकाऱ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांनी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्तीवरील सर्व शेंदूर काढला. त्यामुळे या लेखिकेच्या शिल्पाने कित्येक वर्षांनी मोकळा श्वास घेतला. 
    शेंदूर काढल्यानंतर आता लवकरच माणकेश्वर मंदिराच्या स्थळ व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडाही तयार करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या प्रसंगाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आपल्या ऐतिहासिक वारशाप्रती जागरूक होऊन त्यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत व आपल्या या वारशास कोणत्याही स्वरूपाची हानी होणार नाही याची दक्षता घेणेबाबत पुरातत्त्व विभाग आव्हान करत आहे. 





















एकूण मूर्तींचे सौष्ठव, मोजके आकर्षक अलंकार व आखीव रेखीव स्थापत्यामध्ये कल्याणी चालुक्य कलेची छाप जाणवते.   माणकेश्वर मंदिराच्या परिसरांत प्राचीन मुर्तींचे अवशेष आढळून येतात. तसेच काही मध्ययुगीन समाध्या आहेत. मंदिरासमोरचा सभामंडप आहे तेथे मोठा शिल्पाविष्कार एकेकाळी असावा. त्याचे अवशेष अजूनही आजूबाजूला सापडतात. तेंव्हा हा सगळा परिसर संरक्षीत करण्याची नितांत गरज आहे.
      या सुंदर प्राचीन अद्वितीय शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या बाजूलाच नविन झालेले सटवाईचे मंदिर व नदी परिसर आहे. इथे लहान मुलाचे जावळं काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. मंदिराच्या परिसरांतच बोकड कापल्या जातो. सगळा परिसर त्याने अस्वच्छ होतो. बाजूच्या सटवाई मंदिराला वेगळी संरक्षक भिंत करून त्याचा परिसर वेगळा केला पाहिजे. नदीच्या काठावर सुंदरसा घाट बांधून या परिसराला रम्य बनवता येईल.

          शिव-सटवाई ह्या ग्रामदैवताची हेमाडपंथी मंदिरे विश्वरूपा नदीच्या डाव्या तीरावर, माणकेश्वर गावापासून पूर्वेस, एक-दीड किलोमीटर अंतरावर आहेत. शिव आणि सटवाई या दोन देवतांच्या उत्सवप्रसंगी धार्मिक विधी सामुहिक स्वरूपात पार पाडले जातात. ग्रामस्थांमध्ये त्या निमित्ताने ऐक्य व सामंजस्य या भावनांचा सागर ओसंडून वाहताना दिसतो. माणकेश्वरची ख्याती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक – आंध्रापर्यंत पसरलेली दिसून येते.
          नदीतीरावर उगमापासून अस्तापर्यंत अनेक शिवालये आहेत. मात्र शिवालयांसंदर्भात आणि तेथे सुरू असणाऱ्या सण-उत्सवासंदर्भात व तेथील देव-देवता यांच्या संदर्भात लिखित स्वरूपाची माहिती उपलब्ध नाही. जी माहिती समोर येते ती तेथील पुजाऱ्यांनी मौखिक स्वरूपात सांगितलेल्या आख्यायिकांवरून.
माणकेश्वर येथील शिव-सटवाई मंदिर आणि माणकेश्वर गाव यांच्या नावासंदर्भात काही आख्यायिका आहेत. माणकेश्वर येथील शिव-उत्सव आणि सटवाई-उत्सव यांचे स्वरूप भिन्न-भिन्न आहे. ते वेगवेगळ्या तिथींना करण्याची प्रथा आहे. शिव-उत्सव श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी आणि महाशिवरात्र या दिवशी केला जातो. सटवाईचा उत्सव बाराही महिने असतो. सटवाईची पूजा आणि तिचा उत्सव प्राचीन मातृसत्ताक समाजव्यवस्थेतून निर्माण झाला. तिच्या उत्सवाकरता कोणताही दिवस ठरलेला नसतो. मात्र मंगळवार, शुक्रवार, चैत्रशुद्ध पौर्णिमा आणि विशेष करून नवरात्र यावेळी सटवाईचा उत्सव थाटामाटात साजरा होतो. ‘बोकडांचे बळी’ हा उत्सवाचा खास विशेष. सटवाई हे जागृत देवस्थान मानले जाते. उत्सव सुगी-सराईचे दिवस संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात भरतो. तिच्या उत्सवाचे खरे स्वरूप नवरात्रात अनुभवण्यास मिळते. इतर वेळी, वर्षभर केला जाणारा उत्सव म्हणजे सटवाईला केलेले नवस फेडण्याचा कुलाचार असतो.


        नवरात्र महोत्सव सटवाई मंदिरात घटस्थापनेपासून - आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून - सुरू होतो. त्या नऊ दिवसांमध्ये पहाटेपासून देवीची सिंहासनसदृश पूजा बांधून तिची नित्यपूजाअर्चा व आरती असा कार्यक्रम सुरू होतो. मंदिरात अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. आसपासचे आणि गावातील आराधी देवीची भक्तिगीते तन्मय होऊन गातात. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असंख्य भक्तगण हातात परडी, पाजळण्यासाठी पोत घेऊन उभे राहतात. आराधी तेल जाळून, मंडळास पैसे दान करून सटवाई मातेचे दर्शन घेतात. रात्रभर भक्तिगीतातून आई अंबाबाई सटवाईचा महिमा गायला जातो. पहाटे, देवस्थानच्या ट्रस्टींच्या हस्ते सपत्निक होमाची पूजा केली जाते. ‘आई राजा उदो ऽ उदो ऽ ऽ’ म्हणून देवीच्या नावाचा गजर होतो. शेवटी, ‘दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी’ ही आरती म्हटली जाते. माणकेश्वरमधील शिव आणि सटवाई यांची मंदिरे कोणी बांधली? कधी बांधली? मंदिरावरील मूर्तीची भग्नावस्था कोणी केली? प्राचीन कालखंडात तेथे किती मंदिरे अस्तित्वात होती? मल्लिकार्जुन हे स्वयंभू शिवलिंग आहे का? सटवाई तेथील लोकजीवनात कशी रूढ झाली? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आख्यायिकांवरूनच संकलित करावी लागतात. माणकेश्वर येथील शिव-सटवाईविषयी मंदिर, दातकोणीचे झाड, समाधी, देवळाली ते माणकेश्वर भुयारी मार्ग, गायनागोबा, पुरलेले धन, बळी प्रथा व विश्वरूपा नदी यांविषयीची आख्यायिका आहेत.

लोकवाङ्मयाच्या अभ्यासकांनी आख्यायिकांचे भटकी दंतकथा (आख्यायिका) आणि स्थानिक आख्यायिका अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. स्थानिक आख्यायिकेचे (दंतकथा) पूजाविधी संदर्भातील आख्यायिका, ऐतिहासिक आख्यायिका, देव-देवतांविषयक आख्यायिका, मंदिर स्थापत्यकलाविषयक आख्यायिका, भगतांच्या गद्यपद्यमिश्रित आख्यायिका आणि नवसपूर्तीच्या आख्यायिका अशा उपप्रकारांत वर्गीकरण केलेले आहे. येथे मी केवळ देव-दैवतविषयक, उत्सवविषयक आणि मंदिर-स्थळविषयक आख्यायिकांचेच विश्लेषण प्रमाण ठेवले आहे.
   स्थानिक ग्रामस्थ सांगितात की “मणिकेश्वर या नावावरून गावास माणकेश्वर हे नाव पडले असावे.” तसेच र.आ. अंधारे यांनी औरंगाबाद येथील दैनिक ‘समाचार’मधून ‘राजा दक्ष’ने “यहाँ माणिक लिंग की स्थापना की थी| इस लिए इस गाँव का नाम माणकेश्वर कहलाया” अशी माहिती दिली आहे.
सटवाई मंदिर आणि सटवाईविषयक काही आख्यायिका प्रा. डॉ. नवनाथ शिंदे लिखित ‘माणकेश्वराचे शिव-सटवाई’ या ग्रंथामध्ये उपलब्ध होतात. त्या अशा :
• माणकेश्वर येथील शिवमंदिर आसुरी शक्तीद्वारे एका रात्रीत बांधले गेले व नंतर दिवस उगवण्याच्या आधी असुर नाहीसे झाले!
• देवळाली ते माणकेश्वराचे शिवमंदिर यांच्या दरम्यान एक भुयार आहे. देवळाली येथील ग्रामस्थ आबा शंख हे यवनकाळात त्या भुयारी मार्गाचे तीन किलोमीटर अंतर रोज चालत येऊन महादेव मंदिरात तेलाचा दिवा लावत असत.
• महादेव मंदिराजवळच दातकोरणीचे झाड आहे. त्या झाडाला लागणाऱ्या फळांच्या बियांना महादेवाच्या पिंडीचा आकार निसर्गत: प्राप्त झाला आहे. झाडाचा पाला अनेक रोगांवर गुणकारी समजला जातो.
• चालुक्य काळातील राजा दक्ष याने माणिक लिंगाची स्थापना केली होती. म्हणून त्या गावास माणकेश्वर असे नाव पडले.
प्रभाकर देव यांनी ‘Temples of Marathwada’ या शिवमंदिर व शिवविषयक ग्रंथामध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ती अशी “Mankeshwar is a small village located at the distance of few miles from Osmanabad, a district headquarter of the region. Right in the village is a beautiful antiquarian remain in the form of chalukyan architecture. It is Mahadev Temple.” त्यांच्या मते, शिव म्हणजे मंगल व कल्याण स्वरूप देवता. त्याला महादेव, महेश, नीलकंठ, शंकर अशा अनेक नावांनी संबोधतात. शिवाच्या अशा नामाभिधानावरून मंदिरासही विविध नावे मिळाली असली तरी भाविक भक्तगण त्या मंदिरास शिवमंदिर असेच संबोधतात.
सटवाईच्या नावासंदर्भात शैव पुराणात सांगितलेल्या आख्यायिकेचा संदर्भ असे निर्देशित करतो, की शिवाचे दहा अवतार होते. त्या दहाही अवतारांत शिवाला वेगवेगळ्या दहा बायका होत्या. त्यांतील नवव्या अवतारात शिव मातंग आणि पार्वती मातंग अशा रूपाचा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात सटवाई या नावाचे श्रद्धेचे स्थान आहे. शब्दकोशातील अर्थाप्रमाणे सटवी हे स्त्रीलिंगी नाम असून षष्टी देवता, शूद्र देवता, सटी, सट, सठी, दुर्गा देवता, रान सटवाई, संतुबाई, सुभान, मेहमाता, जातमातृ, छटी, ब्राह्मी, कुमारी, बहुपुत्रिका, वारुषी, यानिका, रौंद्री, घोडा सटवाई अशा तिच्या नावांसंदर्भात आख्यायिका आहेत. पैकी शैव पुराणातील आख्यायिकेस विशेष महत्त्व आहे. मातंग समाजातील शिव आणि मातंगी समाजातील सटवाई पूर्वी एकाच मंदिरात होती. परंतु सटवाईला बकरू (देवीला सोडलेला बोकड) लागतो, म्हणून तिला बाजूला ठेवण्यात आले. सटवाई ही मातंग ऋषींची मुलगी असून महादेव हा मातंग समाजाचा जावई आहे. बकरे पडत असूनसुद्धा दोघे जवळ हायती. मग ती कोण हायती? तर सटवाई आणि महादेव नवरा-बायकोच हायती.
देवीच्या मंदिर स्थापत्याबाबतही काही आख्यायिका सांगितल्या जातात. सटवाईचे मंदिर मूळ पार्वतीमातेचे मंदिर असले पाहिजे. प्रा. रजनी जोशी यांनी ती मंदिरे एकाच वेळची असून जेथे शंकराचे मंदिर असते तेथे पार्वतीचेही मंदिर असलेले दिसून येतेच असे मत नोंदवले आहे. त्यांनी देवी ही एकच असते. तिने अनेक रूपे धारण केलेली असतात अशा ग्रामस्थांच्या सूरात-सूर मिसळलेला आढळतो, तर पुरातत्त्व विद्या शाखेच्या अभ्यासक डॉ. माया पाटील यांनी सटवाईला मातृका म्हटले जाते असा त्यांचा अभिप्राय नोंदवला आहे. माणकेश्वर येथे मातृदेवतेची पूजा-उपासना प्राचीन काळापासून केली जात असली पाहिजे. त्या देवळांशेजारी जगदंबेचे देवालय आहे. ती देवी म्हणजे सटवाई हीच देवी होय असे कुमार जोशी यांना वाटते.
सटवाई देवीबरोबरच तिच्या पायाखाली असणाऱ्या दैत्याच्या अनुषंगानेही सुरेश जगदाळे यांनी सांगितलेली आख्यायिका अशी, “देवीने दैत्याला मारले. त्यावेळी देवीला दैत्याची दया आली. त्याला देवी म्हणाली, ‘बाबा, शेवटचे मागणे काय असेल तर माग.’ दैत्याने मागणी घातली, की ‘माझा जो मांसाहार आहे तो मला शेवटपर्यंत पुरव.’ देवीने ‘हो’ म्हणून दैत्याला वचन दिले. देवीच्या पायाखाली दैत्याची मूर्ती आहे. त्यावरून देवीसमोर बकरे कापले जाते. देवीला मात्र शिवाप्रमाणे गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.”
      आज सटवाई मंदिर हेही कदाचित पूर्व मध्ययुगीन स्त्रीदेवतेचे लोकदैवतीकरण झाले असावे. राजाश्रय असलेले शिवालय व लोकदेवतेचे स्थान आज माणकेश्वर अभिमानाने बाळगून आहे. 
 या ठिकाणांची योग्य माहिती तिथे फलक लावल्यास येणाºया भाविकांना व पर्यटकांना उस्मानाबादचे एक दुर्लक्षित सांस्कृतिक अंग जाणून घेता येईल. अशी पुरातन मंदिरे हा फार मोठा ऐतिहासिक मोलाचा ठेवा आहे. तो आपण जतन करायला पाहिजे. अशी मंदिरे आज बांधता येत नाहीत. तर निदान त्यांचे जतन तरी काळजीपूर्वक केले पाहिजे.

 संदर्भ :-
१) धाराशिव जिल्हा गॅझेटीयर
२) श्रीकांत उमरीकर यांचे लिखाण
 ३) https://www.discovermh.com/mankeshwar-temple/
४) आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची फेसबुक पेज
५) https://www.lokmat.com मधील साईली कौ. पलांडे-दातार यांचा लेख
६) https://www.khasmarathi.com/2023/05/mankeshwartempalehistory%20.html 
७) https://jsnewstimes.com/maharashtra/that-letter-writer-from-osmanabad-breathed-a-sigh-of-relief-removed-a-three-to-four-inch-thick-layer-of-sander
८) 
 
 




























 उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यामधील माणकेश्वर येथील पत्रलेखिकेच्या शिल्पावरील तीन चे चार इंच जाडीचा थर काढल्यामुळे पत्रलेखिकेने मोकळा श्वास घेतला आहे. शेंदराचा थर काढल्यानंतर मंदिर संस्थान आणि गावकऱ्यांनी उर्वरित सर्व ठिकाणी लावलेला शेंदूर काढून परिसराची स्वच्छता करण्याची हमी देत यापुढे असा प्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत आश्वासन दिले. यामुळे पुरातत्त्व विभाग आणि इतिहास प्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे.  

जिल्ह्यातील माणकेश्वर मंदिर येथील पत्रलेखिकेचे हे शिल्प गेल्या कित्येक वर्षांपासून शेंदराच्या थराखाली झाकलेले होते. माणकेश्वर मंदिराच्या शेजारीच सटवाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दर्शनाला असंख्य भाविक येत असतात. सटवाई देवी लहान मुलांचे भविष्य पाटीवर लिहिते अशी अख्यायिका आहे. सटवाई देवी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या चालुक्यकालीन असलेले मंदिर ज्यावरुन या गावाचेही नाव पडले आहे, असे माणकेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पत्रलेखिकेचे शिल्प आहे. परंतु, या पत्रलेखिकेवर शेदराचा मोठ्या प्रमाणात थर चढला होता. 

सटवाई देवीच्या अख्यायीकेशी साम्य दर्शविणारे लेखिकेचे हे शिल्प समजून लोकांनी त्यावर शेंदूर लावण्यास सुरवात केली. वर्षानुवर्षे शेंदूर लावला जात असल्याने मूर्तीवर जाड थर तयार झाला होता. त्यामुळे अक्षरशः मूर्तीचे मूळ स्वरुपही पूर्णपणे झाकले गेले. काल पुरातत्त्व विभाग आणि औरंगाबाद येथील अधिकारी मंदिराच्या पाहणीसाठी गेले असता, या प्रकारावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांची समजूत काढून आपल्या गावात असलेल्या या प्राचीन व अतिशय महत्त्वपूर्ण  वारशाप्रती जागरूक होण्याबाबत गावकऱ्यांना आव्हान केले. अधिकाऱ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांनी पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्तीवरील सर्व शेंदूर काढला. त्यामुळे या लेखिकेच्या शिल्पाने कित्येक वर्षांनी मोकळा श्वास घेतला. 

शेंदूर काढल्यानंतर आता लवकरच माणकेश्वर मंदिराच्या स्थळ व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडाही तयार करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या प्रसंगाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आपल्या ऐतिहासिक वारशाप्रती जागरूक होऊन त्यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत व आपल्या या वारशास कोणत्याही स्वरूपाची हानी होणार नाही याची दक्षता घेणेबाबत पुरातत्त्व विभाग आव्हान करत आहे. 

कोणत्याही वारसा स्थळी अशा स्वरूपाचे गैरवर्तन होत असल्याचे आढळून आल्यास तेथील लोकांना या वारसावैभवाप्रती जागरूकता निर्माण करून दिली पाहिजेत, श्रद्धा ही डोळस असावी ही जाणीव निर्माण करून दिली पाहिजे.  
पुरातत्त्व विभाग तर आपले कार्य करत असतेच. परंतु वारसा जतन करण्याच्या कार्यात सामान्य नागरिकांचे योगदान असणेही तेवढेच अपेक्षित आहे. शेवटी ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी की, सांस्कृतिक वारसा हा लोकांद्वारे, लोकांचा, लोकांसाठी आहे, अशा भावना भाविकांमधून व्यक्त होत आहेत. 



 

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575  


महादेव मंदिर, माणकेश्वर, भूम, उस्मानाबाद
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले माणकेश्वर येथील महादेवाचे मंदिर खरंच एक मंदिर माणिक आहे. अत्यंत सुंदर शिल्पकामाने नटलेले हे मंदिर इ.स.१२१७च्या दरम्यान, यादव नृपती सिंघणच्या काळात बांधले गेले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य मंदिरासमोर नंदी मंडपाचा गजथरयुक्त चौथरा आहे. मुखमंडपात बसण्यासाठी कक्षासने असून त्याच्या पाठच्या वामन भिंतींवर अर्ध स्तंभ व मानवी आकृती, गजथरयुक्त आहेत. मंदिरातील स्तंभ, मुख्यतः सभामंडपातील रंगशिळे भोवतीचे स्तंभ आकर्षक आहेत व त्याच्या पायथ्याशी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती कोरल्या आहेत.त्यातील वेणुगोपालची हातात कालिया नाग असलेली मूर्ती वेगळी आहे. स्तंभ व अर्धा स्तंभाचे स्तंभ शीर्ष भारवाहक किचकांचे आहेत व स्तंभ मध्यावर व्याल, देवता मूर्ती व प्राणी कोरलेले आहेत. गर्भगृहाची द्वारशाखा ७ शाखांची हस्तिनी प्रकारची ज्येष्ठद्वारा असून महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये दुर्मिळ आहे.

प्रदक्षिणा पथ मंदिराच्या तलविन्यासाप्रमाणे फिरतो व आपल्याला बाह्य अंगावरील मूर्ती बघता येतात. चार दिशेला दिशांचे स्वामी दिक्पाल इंद्र, वरूण, यम आणि कुबेर आपल्या वाहनांसोबत दिसतात. मर्दला, पुत्रवल्लभा, दर्पणा, पत्रलेखिका ह्या सूरसुंदरींबरोबर शिवाची विविध रूपे, मएकूण 350 च्या जवळपास शिल्पांनी नटलेल्या माणकेश्वर मंदिरात काल जाण्याचा योग आला.कारण होते पुरातत्व विभाग उपसंचालिका असणाऱ्या माया पाटील मॅडम यांच्या अभ्यासवर्गाचे..!!

काल प्रथमच मंदीर,त्याची रचना आणि तो बांधन्यामागे असणारा उद्देश समजला.
माणकेश्वर हे एक शिवालय आहे.या मंदिराची प्रमुख देवता शिव म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात शिल्पे ही शिवाची अथवा त्याच्या अवताराची आढळून येतात.
एखादे मंदिर लांबुन ओळखू येण्यासाठी या शिल्पांची मदत होते.म्हणजे त्या शिल्पाने घातलेली वस्त्रे,त्याच्या हातातील आयुधे,अलंकार यांवरून त्या शिल्पाची ओळख होते.त्याच्या पायाशी असणाऱ्या वाहनावरूनही ते शिल्प कुठल्या देवदेवतेचे आहे,हे समजते.
ज्या ठिकाणी देवाचे शिल्प असते,तेथे त्याच्या डोक्यावर एक छोटे कळस निर्माण केलेले असते आणि त्या शिल्पाच्या पायात त्याचे वाहन..!!त्यावरून नेमके देवाचे शिल्प आणि नृत्यांगना,यक्ष यांच्या शिल्पांची विभागनी करता येते.
मंदिराचे बांधकाम हा एक अभ्यासपूर्ण विषय आहे.म्हणजे,मंदिराचा पाया किती असावा त्यावर किती मोठे मंदिर उभारता येईल,त्यात उभारलेल्या खांबावर कीचक आणि उलट्या नागाचे शिल्प का कोरलेले असते या सर्वांची उत्तरे काहीशी स्मितीत करणारी आहेत.म्हणजे,कीचक आणि नाग कितीही वजन पेलू शकतात म्हणून त्यांची निर्मिती खांबावर केलेली आढळते.
त्यात मंदिर हे एकूण 4 टप्प्यांमधे बांधण्यात येते.
1-सभागृह
2-रंगशिला (देवासमोर कला सादर करण्यासाठी प्रयोजन)
3-अंतराल (सभागृह आणि गाभारा यांतील भाग)
4- गाभारा
मंदिर प्रवेश करताना वरच्या बाजूला निर्मिलेल्या यक्ष आणि किन्नरांच्या शिल्पांच्या मागे असणारे कारण म्हणजे आकाशातून पुष्पवृष्टी करणारे देवगण..!!
आत संभामंडप.त्यात या मंडपाचे छत किती भागात विभागले गेले आहे यावरून ते मंदिर कुठल्या प्रकारात बांधले आहे ते स्पष्ट होते.काल मी पाहिलेले मंदिराचे छत हे एकूण 9 भागात विभागले होते म्हणजे नक्षत्रप्रमाण..!!
हे मंदिर हेमाडपंथी प्रकारात मोडत असले तरीही हे 11व्या शतकात चालुक्यांनी बांधलेले आहे.नंतर 12व्या शतकात यादवांनी या मंदिराला दानधर्म आणि काही बांधकाम केले.तसा शिलालेखही येथे आहे.
मंदिराच्या गाभार्याच्या आजुबाजूला कोरलेल्या शाखा ह्या अभ्यासजोग्या.म्हणजे वाद्य वाजवणारे,वेल,शोभेची कला अशा मिळून अनेक शाखा गाभार्याच्या प्रवेशद्वारावर कोरलेले असतात.त्या काही वेळेस 5,7 या त्याहीपेक्षा कमी जास्त असू शकतात.
मंदिराबाहेर मागच्या बाजूला एक शिल्प आहे.त्याला पूर्ण शेंदुर लावला आहे.(खालील चित्रात ते स्पष्ट दिसून येईल.)खरेतर ती एक लिखाण करणारी स्त्री आहे.तिच्या डोक्यावर कसलेही शिखर दिसत नाही आणि पायाशी कुठलेही वाहन नाही.म्हणजे ही देवयोनीमधे मोडत नाही.
मग लिखाण करणारी स्त्री म्हणजे सरस्वती असा समज करुन त्या शिल्पाचे पार वाटोळे केले.खरेतर 11व्या शतकात लिखाण करू शकणारी स्त्री म्हणजे आपल्या वैभवशाली इतिहासातील एक स्त्रीशिक्षणाचे प्रतीकच..!!
असे म्हणतात की अफझलखान जेव्हा स्वराज्यावर चालून आला,तेव्हा याही मंदिराला त्याचा उपसर्ग पोहोचला.तसे उल्लेखही आढळतात.(संदर्भ : शककर्ते शिवराय)आणि इथल्या शिल्पांची अपरिमित हानी झाली.
जर आज इथली सर्व शिल्पे उत्तम आणि सुस्थितीमधे आढळली असती,तर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून 'माणकेश्वर' ओळखल्या गेले असते.
डॉ.माया पाटील यांनी केलेले मार्गदर्शन हे लाखमोलाचे होते.प्रत्येक शिल्पाची दिलेली इत्यंभूत माहिती म्हणजे आमच्यासाठी बुद्धीचे खुराक..!!त्यांनी सांगितलेले एक वाक्य खूप आवडले,

"संस्कृतीच्या निव्वळ पोकळ गप्पा मारण्यापेक्षा त्या संस्कृतीचे अवशेष असणाऱ्या वास्तू किमान आपण जपल्या पाहिजेत."हिषमर्दिनी, सरस्वतीची शिल्पे आहेत. लक्ष्मी, कौमारी, ब्राह्मणी, इंद्राणी इत्यादी मातृका आहेत. पाणी वाहून जाण्यासाठी कोरीव मकर प्रणाल आहे.

एकूण मूर्तींचे सौष्ठव, मोजके आकर्षक अलंकार व आखीव रेखीव स्थापत्यामध्ये कल्याणी चालुक्य कलेची छाप जाणवते. जवळच प्रसिद्ध सटवाईचे मंदिर व नदी परिसर आहे.     


राजाश्रय लाभलेले शिल्प माणिक

लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:11 PM2017-09-03T13:11:26+5:302017-09-03T13:17:08+5:30

A Temple having royal guard | राजाश्रय लाभलेले शिल्प माणिक

राजाश्रय लाभलेले शिल्प माणिक

- साईली कौ. पलांडे-दातार

इतिहासाचा धांडोळा घेता आपल्याला अणदूर शिलालेखात चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्याच्या मुलाने, मल्लिकार्जुन यांच्या या मंदिरास दान केल्याचे पुरावे सापडतात. स्थानिक लोक मंदिर ‘मल्लिकार्जुन मंदिर’ या नावाने ओळखतात, हा योगायोग नसावा. मंदिराच्या सभामंडपातील खांबावर असलेल्या शके ११४५ सालातील शिलालेखात आपल्याला यादव राजा सिंघन याने या मंदिराला दान दिल्याची नोंद सापडते. लेख त्रुटीत असल्याने पुढील माहिती कळत नाही. मंदिर व शिल्पांची शैली व ऐतिहासिक पुरावे बघता मंदिराची निर्मिती नक्कीच १२ व्या शतकात झाली असावी.
मुख्य मंदिरासमोर दोन ते अडीच फुटांचा गजथर कोरलेला मोठा चौथरा आहे जो की कधीकाळी वाहन मंडप असावा.

मूळ मंदिर हे उंच पीठावर उभे आहे आणि त्या उंचीवरून मंदिराभोवती मंदिराच्या तलविन्यासाच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग तयार केलेला दिसतो. आज देवळाचे शिखर अस्तित्वात नाही ना त्याचा अंदाज येण्यासाठी खुणा शिल्लक आहेत. पाय-या चढून जाता मुख मंडप गूढ मंडप (भिंतींनी बंद असलेला), देवकोष्ठयुक्त अंतराळ व तीन गर्भगृह अशी रचना दृष्टीस पडते. मंदिराच्या मुखमंडपाच्या बाजूने बाहेर आलेले देवकोष्ठयुक्त अर्धस्तंभ ही महाराष्ट्रात कुठेही न आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण रचना होय! मुख मंडपात वामनभिंतीवर (अर्ध्या उंचीच्या) गजथर, मनुष्यकृती व शिखरयुक्त स्तंभाची रचना आहे आणि मागील बाजूने बसायला कक्षासने आहेत. 

मंदिराच्या सभा मंडपाचा व गर्भगृहांचा तलविन्यास तारककृती असल्याने मूर्ती कोनात बसवल्या आहेत. उपपीठावरील उपान पट्टीवर देवता मूर्तीचे शिल्पांकन आहे. गर्भगृहावरील ३, सभा मंडपावरील २ व मुखमंडपाच्या बाजूची २ अशी एकूण ७ देवकोष्ठे आहेत; पण ती दुर्दैवाने रिकामी आहेत. सभामंडपाचे छत समतल असून कमलाकृती व मनुष्याकृती कोरल्या आहेत. मुख्य द्वारशाखा ७ शाखांची हस्तीनी प्रकारची आहे व शैव द्वारपाल, नदी देवता, प्रतिहारी पायापाशी कोरले आहेत. ललाटबिंबावर गणेश प्रतिमा आहे व मुख्य माणकेश्वराचे लिंग गर्भगृहात आहे. मंदिरामधील रंगाशिलेभोवती चार स्तंभांवर नक्षीदार अलंकरण असून चौकोनी भागावर देवता मूर्ती आहेत, त्यात कालिया मर्दन, बन्सीधर कृष्ण व नंदिकेश्वरची शिल्पे बसवलेली आहेत. स्तंभांवरील मधल्या चौकटीत भैरव आचार्य योगी प्रतिमा आहेत. त्यावरील एका पट्टीवर यादव राजा सिंघन देवाचा लेख नागरी लिपीत कोरलेला आहे.

मराठवाड्यात, औंढा नागनाथ मंदिराखालोखाल सर्वात अधिक पूर्णाकृती शिल्पे महादेव मंदिराच्या बाह्यभागावर आढळतात. त्यात अर्धस्तंभांच्या मध्ये सूरसुंदरी व देवता मूर्ती बसवल्या आहेत. आठ दिशांचे आठ दिक्पाल अनुक्रमे कुबेर, ईशान, इंद्र, अग्नी, यम, निऋती, वरुण व वायू हे त्यांच्या वाहनांसोबत कोरले आहेत. मंदिरावरील दोन महिषमर्दिनी व दोन महिषासूरमर्दिनी या गतिशील आणि तेवढ्याच सुबक आहेत. शिवाचे भैरव स्वरूप, अंधकासुर वधमूर्ती, नटराज ही शिवाची विविध रूपे मंदिरावर अंकित आहेत. सरस्वती, चामुंडा, दुर्गा, ब्रह्मा, हरिहर, भैरव, बटू भैरव, गणपती, २४ प्रकारच्या विष्णुमूर्तीमधील काही शिल्पे अशी बरीच रेलचेल आहे.

मंदिराच्या बटूभैरव मूर्तीच्या हातात खटवांग (दंडावर मानवी कवटी) नावांचे आयुध दिसते व त्यातील खटवांगाच्या डोळ्याच्या खोबणीतून बाहेर आलेला साप दाखवला आहे. मर्दला, पुत्र वल्लभा, दर्पणा पत्रलेखिका, कर्पूरमंजिरी या चालुक्यांना प्रिय असलेल्या सूरसुंदरी मंदिरावर शिल्पांकित केल्या आहे. प्रदक्षिणा मार्गावर सुबक मकरप्रणाल एक कोनात कोरले आहे. इंद्राणी, ब्राह्मणी, वैष्णवी, करवीर निवासिनी महालक्ष्मी ही शक्तिरूपे मंदिराचे वेगळेपण आहे. मंदिर शिल्पे जरी काही प्रमाणात खंडित असली तरी मूर्तीचे शरीरसौष्ठव, प्रमाणबद्धता, वस्त्रांचे घोळ, दागिन्यांची नाजूक नक्षी व डौल हा वाखाणण्याजोगा आहे. बहुतेक मूर्ती त्रिभंग (तीन कोनात वळलेल्या) असून नृत्यमग्न आहेत, तर काही समभंग आहेत. मंदिराच्या आसपास खंडित मूर्ती विखुरलेल्या दिसतात तसेच काही मध्ययुगीन समाध्या आहेत. 

आज सटवाई मंदिर हेही कदाचित पूर्व मध्ययुगीन स्त्रीदेवतेचे लोकदैवतीकरण झाले असावे. राजाश्रय असलेले शिवालय व लोकदेवतेचे स्थान आज माणकेश्वर अभिमानाने बाळगून आहे. या ठिकाणांची योग्य माहिती तिथे फलक लावल्यास येणाºया भाविकांना व पर्यटकांना उस्मानाबादचे एक दुर्लक्षित सांस्कृतिक अंग जाणून घेता येईल. 

(लेखिका पुरातत्वज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ आणि इतिहास संशोधक आहेत.)


राजे चालुक्य द्वारा निर्मित मानकेश्वर महादेव मंदिर . हे मंदिर बाराव्या शतकामधील महादेव मंदिर |mankeshwar mahadev mandir


mankeshwar mahadev mandir
मानकेश्वर महादेव मंदिर|mankeshwar mahadev mandir



मानकेश्वर महादेव मंदिर |mankeshwar mahadev mandir

ता भूम जिल्हा धाराशिव अप्रतिम शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना राजे चालुक्य द्वारा निर्मित मानकेश्वर महादेव मंदिर . हे मंदिर बाराव्या शतकात बांधले गेले असावे असे तज्ञांचे मत आहे.


धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात बार्शी पासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर बार्शी भूम रोडवर ( माणकेश्वर मार्गे ) हे प्राचीन महादेव मंदिर आहे. मंदिराच्या बाह्य भागावर अप्रतिम असे सुरसुंदरीचे शिल्प आणि देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्य भागावरील शिल्पाला प्रमाणाच्या बाहेर हळदी कुंकू फासले आहे. शिल्पाना हळदी कुंकू फासन्याचे कारण समजले नाही.या मुळे शिल्पाचे मुळ सुंदरता झाकली जाऊन शिल्प विद्रुप दिसत आहेत.


मंदिराच्या खोल गर्भगृहात महादेवाची मोठी पिंड आहे. मंदिरासमोर नंदीमंडप असून मंडपात मोठ्या आकाराचा सुंदर नंदी आहे. मंदिराचे गर्भगृहातील पाणी मकरप्रनाल मधुन बाहेर पडते त्या ठिकाणी तर अक्षरशः घानीचा खच पडला आहे.
हे मंदिर विश्वकर्मा नदीच्या किनारी सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी मंदिराची उभारणी केली गेली आहे.


इ स १६५९ मधे अफजल खान शिवाजी महाराजांचा पाडाव करण्याच्या उद्देशाने निघाला. विजापूर, सोलापूर, तुळजापूर, मानकेश्वर,करकंब, भोसे, पंढरपूर. रहिमतपूर मार्गाने वाईस गेला. जाताना वाटेत पडनार्या मंदीराची तोडफोड केली.त्या तोडफोड केलेल्या मंदिरात मानकेश्वर (mankeshwar mahadev mandir)मंदिराचा समावेश आहे.( संदर्भ - मराठी रियासत, भाग १ लेखक गो स सरदेसाई )
या मंदिराच्या बाह्य भागावर असलेल्या देवतांच्या व सुरसुंदरीचे शिल्पांची अफजल खान, मोगल आणि रझाकार यांनी भयंकर तोडफोड केली आहे. 

कुठलेही शिल्प किंवा प्रतिमा पूर्ण अवस्थेत नाही.मंदिर परिसरात खूप सारे तोडलेले मंदिर अवशेष विखुरलेले आहेत. मंदिरा समोरच एक चौथरा आहे. या चौथर्यावर पुर्वी मंदिर असावे. मंदिराच्या परिसरात विखुरलेले अवशेष याच तोडलेल्या मंदिराचे असावेत.
चौथर्यावर गणपती, दोन नंदी, नागदेवता, विरगळ यांचें भग्न अवशेष पडलेले आहेत.
या मंदिराच्या बाजूला एक सटवाई चे मंदिर आहे. या मंदिरात मांस नैवेद्य चालतो. मंदिर परिसरात बकरे व कोंबड्यांचा बळी दिला जातो. हे सर्व करणारे भाविक हि़दूच‌ . येथे दारू पिऊन मटन खाऊन आराम करायला व गोधडी अंथरुण झोपायला मानकेश्वर मंदिरात जातात.


हे थांबायला हवे. भाविकांनी सटवाईची पुजा अर्चा जरूर करावी पण मांस भक्षण करून मानकेश्वर मंदिरात जाऊ नये. अशाने आपणच आपल्या मंदिरांची विटंबना करीत आहेत. मानकेश्वर मंदिर आणि सटवाई मंदिर दरम्यान एक संवरक्षीत भिंत असायला हवी जेणेकरून मंदिराचे पावित्र्य जपले जाईल ‌.


मंदिर परिसरात सर्वत्र घानीचे साम्राज्य आहे. दारुच्या बाटल्या, बियरच्या बाटल्या, नारळाचे कस्पट सर्वत्र पडलेले आहेत. कांहीं महाभाग तर मंदिराचे आजूबाजूला प्रांत:विधी उरकून घेतात.
हे कुठेतरी थांबायला हवे.
मानकेश्वर ग्रामस्थ व महाराष्ट्र पुरातत्व विभागाने या बाबतीत लक्ष घालून येथे मंदिराची होणारी विटंबना थांबवावी ही नम्र विनंती.


संदर्भ :

Jeevan Kawade



 Mankeshwar ( Mahadev Temple )




Mankeshwar is a panchayat village in Bhoom Tehsil, Osmanabad district of Maharashtra, India


It is known for its Shiva temple and Goddess Satwai Devi temple.

The Shiva temple in Mankeshwar, is among the type of temple called "Hemandpanti mandirs"

This mandir is built out of one black rock which has nice beautiful art in it. There is a Shiva Linga in the temple which is below the ground level and you have to get down by stairs for darshan.

Here is a river flowing around the temple which makes a curve around temple.
The Satwai devi temple is beside Shiva mandir. Satwai devi is the goddess of destiny and is also known as the sixth-day goddess.

This temple is built in 1100 to 1150 and of Chalukya era.






http://statewise.blogspot.com/2013/12/mankeshwar-mahadev-temple.html



https://drnavnath.wordpress.com/2016/05/04/shiva-temple-of-mankeswar-bhoom/







No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...