पण दूसरे जे मंदिर वाडेश्वरापेक्षा प्राचीन आणि अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे अन्वा येथील शिव मंदिर. हे मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. इ.स. १००० ते ११०० या काळातील आठ महत्त्वाची मंदिरे मराठवाड्यात आहेत. त्यापैकी हे एक अतिशय सुंदर सुबक असा शिल्पाविष्कार असलेले मंदिर.औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, इ.स.च्या अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मुळात वैष्णव मंदिर होते.



गर्भगृहाच्या बाह्यांगावर वैष्णव देवदेवता आहेत. मेघा, शांति, तुष्टी आणि लज्जा या मुर्ती विशेष उल्लेखनीय आहेत. डॉ.देगलुरकर यांच्या मते या सर्व मुर्तींचा विचार केला तर हे मंदीर वैष्णव आहे. मंडपाचे छत घुमटाकार ( करोटक वितान ) असून टोकाकडे जाईल तसे ते निमुळते होते. हे शिखर वर्तुळाकार वलयांनी बनलेले आहे. घुमटाकार छताच्या सगळ्यात वरच्या बाजुला कमळाची नक्षी आहे. भारतीय परंपरेत पुजेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे रंगभोग आणि दुसरा अंगभोग. धुप दिप वस्त्र फुले गंध अक्षता या सगळ्याला अंगभोग म्हणतात. तर रंगभोग म्हणजे गायन वादन नृत्य. मंडपाच्या रचनेवरून येथे रंगभोग पद्धतीने पुजा होत असावी. याला पुरावा म्हणजे गायन वादन करणारे भक्त या मंदिरावर कोरलेल्या शिल्पांमधून दिसून येतात. अशीच शिल्पे होट्टल आणि धर्मापुरी येथेही आढळून आलेले आहेत.
मंदिराच्या बाह्यभागात गजलक्ष्मी आणि नृसिंह शिल्पे देवकोष्टकांत बसवलेली आहे. ती खुप देखणी आहेत. मंदिराच्या बाह्य भागात हंसपट्टीका, सिंहपट्टीका आढळून येतात. चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्म अशी चार आयुधे असतात. या आयुधांचा त्यांच्या हातातील क्रम बदलला की गणिती शास्त्रानुसार २४ कॉम्बिनेशन्स होतात. त्या प्रत्येक प्रकाराला केशव, माधव, नारायण अशी संध्येत येणारी २४ नावे आहेत. तारकाकृती पीठावर असलेले हे मंदिर खजुराहोच्या कांदारिया महादेव मंदिराच्या पीठाची आठवण करून देते. मंदिराला एकूण ५० स्तंभ आहेत. मंदिरावरील सर्व शिल्पे ही वैष्णव आहेत. हे लक्ष्मीचे मंदिर असावे. मुख्य कोनाडय़ातसुद्धा वैष्णव शिल्पे आहेत.
विष्णूच्या शक्तींचे या स्वरूपातील बहुधा हे एकमेव मंदिर असावे. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे तरीसुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत.
याच मंदिरावर एकमेवाद्वितीय कामशिल्प आढळले आहे. प्राचीन ग्रंथात उल्लेखित असलेल्या कामशास्त्राच्या पद्धती देशभरातील प्राचीन वास्तूंवर आढळतात. अन्वा येथे आढळलेले कामशिल्प इतरत्र कुठेच आढळत नसल्याने ते वैशिष्टपूर्ण ठरते. हे संशोधन पुरातत्व अभ्यासक डॉ. अरविंद सोनटक्के यांनी केले.भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील प्राध्यापक व मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. अरविंद सोनटक्के यांनी मंदिरावरील शिल्पांचा अभ्यास करून ही माहिती उजेडात आणली आहे. मंदिरांवरील शिल्प हे ग्रंथ विचार लोकांपर्यंत पोचविण्याचे माध्यम होते. मनुष्य जीवनातील तीन पुरुषार्थापैकी 'काम' हा एक आहे. काम हे सृष्टीच्या निर्मितीचे मूळ असल्याची धारणा आणि लैंगिकतेकडे व्यापक दृष्टीने पाहण्याची तत्कालीन समाजाची वैचारिक प्रगल्भता शिल्पातून अधोरेखित होते. खजुराहो आणि इतर मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांचा हाच उद्देश दिसतो. अन्वा येथील मंदिरावरील वैशिष्ट्यपूर्ण कामशिल्प इतरत्र आढळले नाही, असे सोनटक्के यांनी सांगितले.
कोणार्क आणि मोढेरा येथील मंदिरांवरही असे कामशिल्प नाही. कामशिल्पासाठी जगप्रसिद्ध असलेल्या खजुराहो मंदिरावरही असे कामशिल्प नाही. त्यामुळे हे कामशिल्प एकमेवाद्वितीय ठरते, असा दावा सोनटक्के यांनी केला आहे. सोनटक्के यांनी कामशास्त्र विषयात पीएच. डी. संशोधन केले आहे. दहा वर्षांपासून कामशिल्पांचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील प्राचीन स्थळांना भेटी दिल्या आहेत. प्राचीन ग्रंथातील दाखल्यानुसार अन्वा येथील शिल्प साकारलेले आहे. सोनटक्के यांनी या विषयावरील शोधप्रबंध प्रकाशित केला आहे.
शिल्पाची वैशिष्ट्ये
अन्वा येथील शिल्प १७ सेंटीमीटर उंच आणि २० सेंटीमीटर रुंद असून शिल्पाचा कर्ण २६ सेंटीमीटर आहे. शिल्प समागामाचे असून त्यातून लैंगिकतेकडे बघण्याची भारतीयांची व्यापक दृष्टी दिसते. कामशास्त्रीय ग्रंथात उल्लेखीत, पण कोरीव कामात न आढळणाऱ्या मूर्तीचा शोध ही एक महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील मंदिरे, लेणी आणि दरवाज्यांवर वैविध्यपूर्ण शिल्प आहेत. या शिल्पांचा पुरातत्व अभ्यासकांनी सखोल अभ्यास सुरू केला आहे.
वात्स्यायनाने 'कामसूत्र' ग्रंथात कामशास्त्राची सविस्तर मांडणी केली आहे. आजच्या काळात धक्कादायक वाटतील अशा पद्धती आणि निष्कर्ष त्यात आहेत. कामतृप्तीसाठी कृत्रिम लिंगाचा वापर आणि मुखमैथून दाखवणारे हे शिल्प तत्कालीन समाजाची व्यापक दृष्टी अधोरेखित करते.
हे मंदिर पूर्वी विष्णुचे अथवा लक्ष्मीचे असावे असा अंदाज बाहेरील शिल्पांवरून वर्तवल्या जातो. पण अर्थात हा अभ्यासकांचा विषय आहे. सामान्य दर्शकाला शिल्पांचे सौंदर्य न्याहाळायचे असते. हे शिल्पसौंदर्य पाहून तो विस्मयचकित होतो. एक हजार वर्षांपूर्वी हा प्रदेश कलात्मकदृष्ट्या किती संपन्न होता याचा पुरावाच या मंदिरावरील अप्रतिम कोरीवकामातून मिळतो.हा प्राचीन वारसा फार महत्त्वाचा आहे. आपल्या अगदी जवळच हे ठिकाण आहे. किमान एकदा तरी हे मंदिर नजरेखालून घातले पाहिजे.

अन्व्याच्या मंदिराचा परिसर आता स्वच्छ करण्यात आला आहे. पण मंदिर संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरांत मात्र घाण बकालीचा अनुभव येतो. ग्रामपंचायतीने याची जबाबदारी घेवून मंदिरालगतचा भाग स्वच्छ चांगला केला तर मंदिराचे सौंदर्य वाढेल. पर्यटकांना इथपर्यंत आणता येईल पण परिसराची बकालपणा पाहून तो परत येण्याची शक्यता नाही.
औरंगाबाद अजिंठा मार्गावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांव वरून डाव्या बाजूला जो रस्ता आत जातो त्याच रस्त्यावर ८ कि.मी. अंतरावरील अन्वा गावात हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरांची अतिशच चांगली बांधबंदिस्ती दुरूस्ती पुरातत्व खात्याने केली आहे. मंदिराची संरक्षक भिंत उभारल्या गेली आहे. संपूर्ण परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. मंदिराचीही डागडुजी करण्यात आली आहे. मंदिराला लोखंडी खांबांचा आधार देवून पुढील पडझड होण्यापासून वाचवले आहे. अजिंठय़ाला जाताना मुद्दाम, आवर्जून अन्वा या ठिकाणी थांबून हे मंदिर पाहून घ्यावे. वैष्णव शक्ती दाखवलेल्या मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. म्हणूनच हे मंदिर वाट वाकडी करून अवश्य भेट द्यावे या दर्जाचे आहे. या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा होय.
(अन्व्या शिवाय इ.स. १००० ते इ.स. ११०० काळातील मराठवाड्यातील महत्वाची सुंदस मंदिरे - १. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, २. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, ३. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, ४. सोमेश्वर मंदिर, होट्टल ५. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड ६. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली ७. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.)
(इ.स. ११०० ते १२०० या काळातील त्रिदल पद्धतीची मंदिर शैली विकसित झाली. अशी सहा मंदिरे मरावाड्यात आहेत. १. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, २. कंकाळेश्वर मंदिर बीड, ३. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद ४. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद ५. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद ६. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड)
संदर्भ :-
१) जालना जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३) डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर
४) श्रीकांत उमरीकर यांचे लिखाण
५) https://www.loksatta.com/lokbhramanti/article-on-lord-vishnu-temple-in-anva-village-at-aurangabad-1185078/
६) https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/erotic-sculptures-of-ancient-india-found-in-anva-aurangabad/articleshow/78384653.cms
Anwa Temple
विष्णूच्या शक्तींचे मंदिर : अन्वा
वारसास्थळांच्या यादीत त्याचा समावेश नसेलही पण जरा वाकडी वाट करुन हे पाहणं नक्कीच लाभदायक ठरु शकते.
Updated:

लोकप्रिय वारसास्थळांना आजकाल पर्यटकांचा प्रचंड ओघ असतो. पण अनेकवेळा या स्थळांजवळच फारसे माहीत नसलेले ठिकाण असते. वारसास्थळांच्या यादीत त्याचा समावेश नसेलही पण जरा वाकडी वाट करुन हे पाहणं नक्कीच लाभदायक ठरु शकते.
महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादला अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. याच अजिंठय़ाला वाटेवर एक अद्वितीय मंदिर वसले आहे ते म्हणजे अन्व्याचे मंदिर. औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, इ.स.च्या अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मूळचे लक्ष्मीचे मंदिर असावे. मंदिराला अत्यंत सुंदर अशा पाच द्वारशाखा असलेले गर्भगृह असून दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाह्य़भागावर विष्णूच्या चोवीस शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्री रूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्य अशी चार आयुधे असतात. भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द येतो आणि त्याचा अर्थ सुद्धा वाचणाऱ्याला लगेच समजतो. परंतु मूर्तीशास्त्रानुसार शक्ती जर दाखवायची असेल तर त्या संबंधित देवाची स्त्रीरुपातील प्रतिमा दाखवली जाते. विष्णूच्या शक्तींचे मूर्तीरुपातील दर्शन या मंदिरावर पाहायला मिळते.
औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर असलेल्या अन्वा इथले मंदिर विष्णूच्या शक्तींचे या स्वरूपातील एकमेव मंदिर असावे. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे तरी सुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहेऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत. वैष्णव शक्ती दाखवलेल्या मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. म्हणूनच हे मंदिर वाट वाकडी करून अवश्य भेट द्यावे असेच आहे.
https://www.loksatta.com/lokbhramanti/article-on-lord-vishnu-temple-in-anva-village-at-aurangabad-1185078/
First heard of this temple in an article in Maharashtra Times (12 May 12 by
Sudhir Joshi). Also found a couple of useful web pages:
Anwa Temple - Anwa Temple Maharashtra, Anwa Temple Aurangabad
Anwa Temple in Aurangabad, Maharashtra, India
Believed to be a Vishnu temple originally which may have got later converted to
Shiva temple.
The pictures reminded me of Kopeshwar temple at Khidrapur, near Sangli, I
visited a few years back. Of course Kopeshwar is much larger temple with much
more elaborate and non repeating carvings. While time and weather does take a
toll on such creations, Kopeshwar was somehow in a little better shape.
The place does not appear properly maintained. There was no guard to be seen on
duty. On generally striking a conversation, villagers said that's a common
occurrence for the guards to disappear from the place.
It was generally good to interact with the villagers. Were cordially asked
whether we need anything, offered drinking water and help with further driving
directions.
Having passed through the village, this view comes across as a sudden
surprise making feel the tough ride to reach here was worth it:

A closer look


The information

Jay - Vijay greeting at the entrance (I think).

Carved central dome
The idol

Carvings inside

Beautifully carved exteriors



Another temple (perhaps they call it some Ashram) around. Its Kalas can be
spotted from a distance. That can guide you to reach here.

Last edited by mayuresh : 16th August 2012 at 21:17.
यात्रेस प्रारंभ:आन्वा येथे आजुबाई देवीच्या यात्रेस प्रारंभ आज निघणार आजुबाई देवीची गावात स्वारी; भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील आजुबाई देवीची यात्रा महोत्सवास प्रारंभ

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील आजुबाई देवीची यात्रा महोत्सवास प्रारंभ झाला असून मुख्य उत्सव म्हणजे स्वारी असतो. शनिवारी रात्री आजूबाईची स्वारी काढण्यात येणार आहे. चैत्र शुध्द तृतीयापासून पासून राम नवमीपर्यंत हा उत्सव चालतो. तृतीयाच्या दिवशी मंडप उभारणी, पहिल्याच दिवशी गावातून पालखीतून श्री ची मिरवणूक काढण्यात आली.
मंडप उभारणी नंतर यात्रा संपेपर्यंत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यात्रा काळात गावातील नागरिक व महिला बाहेरगावी मुक्कामी थांबत नाहीत. गावातून चार दिवस गावातून रोज निघून सोंग, पोत खेळतात. अष्टमीच्या दिवशी प्रत्येक घरात कडक उपवास केला जातो. अशी परंपरा आहे. यात्रेबाबत अशी अख्यायिका सांगितली जाते.
प्राचीन काळात अनंतपूर (आजचे आनवा )हे गाव प्रसिध्द होते सुमारे ४५० वर्षापूर्वी या गावात तुकाराम पंत नावाचे एक ग्रहस्थ राहात होते. त्यांना संतती सुख नसल्यामुळे ते फार दुःखी होते. काही तीर्थयात्रा करावी म्हणून नवरात्रात तुळजापूरला गेले. त्यांनी संतती प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. देवी प्रसन्न होत नसल्यामुळे त्यांनी देह त्यागण्याचे ठरवले. अष्टमीच्या रात्री होम हवन करून त्यांनी यज्ञकुंडात उडी घेतली. याच वेळी आई तुळजाभवानी प्रगट झाली. आपल्याजवळ सारे वेभव आहे परंतु संततीसुख नसल्याचे त्यांनी मातेला सांगितले.
त्यावेळी माता तुळजाभवानीने तुमच्या पोटी मी अवतार घेईन असे वचन दिले. त्यानंतर आन्वा येथे तुकाराम पंतच्या उदरी ४ शालिवाहन शके १४९४ बुधवार रोजी मातेने जन्म घेतला. तिचे नाव आजुबाई ठेवण्यात आले. केवळ पाच वर्षाच्या कार्यात आजुबाईने अनेक चमत्कार गावात घडवले. राजा हिमांशु हा देवीपुढे नतमस्तक झाला. तेव्हापासून आन्वा येथील हे स्थान आजुबाईच्या नावाने प्रसिध्द आहे. चैत्र शुध्द तृतीया पासून रामनवमी पर्यंत येथील उत्सव साजरा करण्यात येतो.
बालब्रम्हचारी लक्ष्मीकांत महाराज यांचे वंशज सोनू महाराज यांच्या अंगात अष्टमीच्या दिवशी स्वारी येते. त्या दिवशी रात्री दहा वाजता सोनू महाराज यांना गावातील मंदिरात आणले जाते. त्यांना देवी समोर बसून आदण्या दिली जाते. नंतर त्यांना स्वारी चे स्वरूप देण्यासाठी नेण्यात येते. स्वरूप देणाऱ्या ठिकाणी सप्तशतीचे पाठ चालू असतात. स्वारी निघतेवेळी गोंधळी मंडळी गोंधळ घेऊन जन्मस्थानी मंडपात येतात. त्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आलेले हजारो भक्त आपल्या पोती प्रज्वलित करतात. याच वेळी आजुबाईची स्वारी निघते. भक्त आपल्या पोती घेऊन पुढे सरसावतात व आजुबाई की जय या नावाने परिसर दुमदुमुन जातो. ४वर्ष वयाच्या मुलापासून वृध्दापर्यंत भक्त यावेळी पोत खेळत आपला नवस पूर्ण करतात.
मूर्तिशास्त्राची प्रयोगशाळा , अन्वा येथील शिवमंदिर
मूर्तिशास्त्राची प्रयोगशाळा , अन्वा येथील शिवमंदिर
➖➖➖➖➖➖➖
सर्व देवामधे श्रेष्ठ......
मस्तकी चंद्र धारण केलेला......
सर्व लोकांचा एकच अधिपती......... मानवी मनातील भयगंड मोडून काढणारा....
देव,दानव व सिद्धी ज्यांच्या सदैव सेवेत असतात .....
असे देवादिदेव महादेव म्हणजेच 'शिव '
महाराष्ट्रात शिवाची अत्यंत प्राचीन मंदीरे आहेत .असेच एक अकराव्या शतकात बांधले गेलेले प्राचीन शिव मंदीर ,शिल्पकलेचा अप्रतिम अविष्कार, नव्हे तर मूर्ती शास्त्र अभ्यासकांसाठी ही एक अभ्यास शाळाच म्हणता येईल.हे मंदीर बुलढाणा शहरापासून धाड -पारध -पिंपळगाव या मार्गावर केवळ ६० किमी अंतरावर आहे . छत्रपती संभाजीनगर वरूनही याचं अंतर केवळ शंभर किलोमीटर आहे. जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यात हे गाव येते .मुख्य रस्तासोडून जिल्हा परिषद शाळेच्या समोरुन गेल्यावर जवळच मंदीर दिसते .सिमेंट मातीच्या जंगलात ही वास्तु दिसताच क्षणी मनाचा सारा क्षीण घालविते .लाखातून एखादाच असेल की जो या मंदीराला पाहताच क्षणी तोंडातून त्याबद्दल उदगार निघत नसतील .
मूर्तिशिल्प व वास्तुशिल्पाचे अप्रतिम दर्शन येथे घडते .मूर्तिचे घडणीवरुन प्रमुख चार प्रकार पडतात त्यापैकी चौथा प्रकार 'शस्त्रोंत्कीर्णा 'हा येतो .या प्रकारात आनखी सात उपप्रकार पडतात त्यापैकी 'शैलजा' 'हा प्रकार म्हणजे पाषाणात अतिक्षय प्रमाणबद्ध कोरीव काम करुन केलेली मूर्ति होय .या प्रकारातील मूर्तीचे दर्शन घडते . या मंदिराचे निर्माण होत असताना दोन प्रकारचे दगड वापरलेले दिसतात आज च्या घडीला ज्या दगडांचा दर्जा चांगला होता त्या दगडावर घडवलेले नक्षीकाम व शिल्पे ही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत परंतु जो दगड कमकुवत निघाला आज त्या दगडाचा मुरुमा मध्ये रूपांतर होतांना दिसत आहे. हे मंदिराचे निरीक्षण केल्यावर दिसते .
पूर्वमुखी असलेल्या या मंदिराला तीन ते चार मिटर उंचीचे उपपिठ आहे त्यावर हे मंदीर उभे आहे .उपपिठाला आठ पायऱ्या असून त्या पायऱ्याच्या बाजूला कोनाड्यात जय व विजय शिल्प आहेत .
उपपिठावर गेल्यावर मुख्य मंडप लागतो . नक्षत्राकृती असलेल्या सभामंडपात गेल्यावर अप्रतिम सूक्ष्म अश्या प्रमाणबद्ध शिल्प व कोरीव कामाचे दर्शन घडते .बहुतेक शिल्पे ही धातूची आहेत की काय म्हणून हाताळण्याचा मोह प्रत्येकाला होतोच.
या मंदीराला ५० गोलाकार स्तंभ आहेत .१२ मुख्य स्तंभावर हे मंदीर उभे आहे . शिवाची स्वायत्तता व त्याचे सामर्थ्य याचे द्योतक असलेला नंदी वर्तुळाकृती रंगशिलेत मध्यभागी स्थित आहे . या मंदिराच्या रंगशिलेला कक्षासन आहे .मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूचे कक्षासन आजही शाबूत आहे त्याच्या बाह्य भागावरील शिल्पाचे निरीक्षण केल्यास त्यावर आलाप व गायन करताना ची शिल्पे दिसतात. रंगशिलेच्या वरच्या भागांमध्ये आपल्याला विविध सूर सुंदरी यांची शिल्पे कोरलेली आहेत .यामध्ये बासरीवादीका, मृदुंगवादीका, खंजिरी वादिका ,मंजिरीवादिका, वीणावादिका, शालभंजिका आदी सूर सुंदरीची शिल्प काढलेली दिसतात.
*कांस्य बंन्सी विणा शंख मृदुंग खंजरी।* *विविधा वादिन्न वश्या च क्वचित नृत्य नायका।।*
यावरून त्या काळात कलेला किती महत्त्व होते याची जाणीव होते. शिल्प शास्त्रामध्ये अशा 32 प्रकारच्या देवांगनांची माहिती येते यामध्ये काही नृत्यांगना आहेत आणि काही वाजंत्रीधारीनी आहेत. उपपिठाच्या समोर चौरसाकृती गाभारा व त्यात पूर्ण चंद्र आकाराचे शिवलिंग आहे .गाभाऱ्याच्या दगडी द्वारावर सुंदर असे चित्र तोरण आहे . गर्भ गृहाच्याद्वारा वरील अप्रतिम शिल्पे ही चालुक्य, होयसळ कालीन पद्धतीचे वाटतात. मंडपामधे वेदीकेवर बारीक नक्षीकाम केलेले दिसते . द्वारावर गणेश पट्टी आहे या द्वाराच्या वर छताला बघितल्यास अप्रतिम असे भौमितिक आकृतीमध्ये निर्माण झालेली दोन झुंबर आजही आपलं मन आकर्षित करून घेतात. हे मंदिर मध्यम नवतालातील उपपिठावरील चार फुटी सोडलेल्या जागेत खजूराहो येथील कंदारिया महादेव पीठाची आठवण करुन देते .मंदीराच्या बाह्यभागावरील शिल्पे सुद्धा मन मोहून घेतात .मंदिराचे शिखर आयताकार की वर्तुळाकार असेल हे नेमके कळत नाही वरील भाग आताच्या काळात सिंमेन्टने भरलेला दिसतो . राज्य पुरातत्त्व विभागाकडे हे मंदिर सध्या संरक्षित असल्याने याची बऱ्यापैकी डागडुगी व निगा राखली जाते.
विदर्भातील मंदिर व मूर्ती शास्त्राचे अभ्यासक विवेक चांदुरकर यांच्या सोबत अनेकदा या मंदिराचा अभ्यास दौरा केला .त्यांच्या सोबतच दौरा करत असताना यशवंत महाविद्यालय नांदेड येथील मंदिर व शिल्प अभ्यासात डॉ अरविंद सोनटक्के त्याचबरोबर सातारा येथील मंदिर व मूर्ती शिल्प अभ्यासक आदित्य फडके यांच्याकडूनही या मूर्ती शास्त्राची प्रयोगशाळा असलेल्या मंदिराची अभ्यासपूर्ण पाहणी करता आली. यावेळी पुरातत्त्व अभ्यासक तथा पुरातत्व संस्था सदस्य डॉ कामाजी डक हे सुद्धा सोबत होते .संपूर्ण भारतामध्ये अन्वा येथील एकमेव शिव मंदिर आहे की ज्या ठिकाणी आपल्याला विष्णूची 24 शक्ती रुपे ही मूर्तीच्या स्वरूपात बघायला मिळतात शैव व वैष्णव या दोन्हीचा समन्वय मंदिराच्या शिल्परचनेतून आपल्याला दिसतो. जेवढे अंतर्भागामध्ये आपल्याला मूर्ती शिल्प व नक्षीकाम दिसते तेवढेच बाह्यभागावरही संपूर्ण मंदिराची परिक्रमा केल्यानंतर आपल्याला सुंदर अशी शिल्पे नजरेस पडतात. या शिल्पांमध्ये उपपीठावर असलेल्या थरावर थर रचत गेलेल्या या मंदिर बांधकामात हंस पट्ट्या, कीर्तीमुख पट्ट्या व इतर भौमितिक आकार असलेल्या पट्ट्या दिसतात. मंदिराच्या बाह्य भागातही अनेक सुरसुंदरी व नर्तिका यांची सुंदर अशी शिल्प आजही दिसतात. यासोबतच साधकांच्या रूपामध्ये उभे असलेली मूर्ती रूपातील साधक आपल्याला मंदिरात जातांना उजव्या बाजूच्या बाह्य भागातील कोनाड्यात दिसतात. गाभाऱ्याच्या बाह्य भागामध्ये आपल्याला देवकोष्टकांची रचना दिसते आणि या अनेक मुर्त्या आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला देवकोष्टकामध्ये असलेला गजांतकशिव आपल्याला दिसतो या शिवाला चार हात आहेत परंतु ते आता भग्न झालेले दिसतात. पायाखाली हत्ती आहे व हत्तीची आता सोंड तुटलेली आहे. दक्षिण भारतात अशा स्वरूपाच्या मूर्ती बघायला मिळतात अशा मूर्ती या पाषाण आणि धातू स्वरूपातही निर्माण झाल्या आहेत या स्वरूपाच्या मूर्तीची निर्मिती पल्लव ,चालुक्य चौल आणि होयसळ यांच्या राजवटीत झाली आहे. यांच्या कालखंडात या स्वरूपाची मूर्ती अत्यंत लोकप्रिय होती. प्राणी रूप धारण केलेल्या असुराचा वध जेव्हा देव करत असत त्या समयी तो असुर त्या विशिष्ट प्राण्याप्रमाणे धिप्पाड आणि शक्तिमान आहे किंवा होता असे लक्षात घ्यायचे असते . त्याचे नामोहरम करणारा देव व देवता त्यापेक्षा अधिक शक्तिमान होती असा त्यातून अर्थ बोध होत असतो .गजासुर संहार ही एक रूपक कथा असून त्यातून शिवाची शक्तिमानता प्रगट होते. अशाच देवकोष्टकामध्ये शिवनटेश्वर, वराहमूर्ती अशी अनेक रूपे असलेल्या मूर्ती सुद्धा आपल्याला बघावयास मिळतात त्याच सोबत आपल्याला विष्णूची 24 स्त्री शक्ती सुद्धा याच भागात दिसतात. मंदिराच्या उत्तर बाजूला गाभाऱ्याच्या बाहेर भागावर आपल्याला गणेशमूर्ती नजरेस पडते. डाव्या सोंडेचा असलेला हा गणेश आहे. या मंदिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असाच एक गणपती आपल्याला भारवाहक यक्षा सोबत भारवाहक गणेश म्हणून मंदिराच्या आतील बाजूस खांबाला तोलून धरताना दिसतो. तो भारवाहक गणेश आहे ज्याची सोंड सध्या तुटलेली आहे. याच भागात खांबावर दोन नाग शिल्पे सुद्धा आहेत. कामशास्त्राचे मूर्ती अभ्यासक डॉ अरविंद सोनटक्के यांनी या मंदिरावर असलेल्या काम शिल्पाचा अभ्यास केला आहे मंदिराच्या दक्षिण बाजूस एका खांबावर दोन ठिकाणी हे काम शिल्पे आहेत त्यांनी वाचता येण्याच्या कामसूत्रातून काही संदर्भ घेऊन या शिल्पाचा अभ्यास सुरु आहे याविषयी ही माहिती प्रत्यक्षपणे त्यांनी दिली. ही अत्यंत दुर्मिळ शिल्पे आहेत असे त्यांचे मत आहे. असे मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले हे शिवमंदिर अजूनही पर्यटकांपासून वंचितच आहे. आता या मंदिराच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रभरातून अभ्यासक येत आहेत बऱ्याच अभ्यासकांनी या मंदिरावर पीएचडी करण्याचे कामही सुरू केले आहे आपल्या भागात असलेले हे सुंदर शिवमंदिर आपण जरूर एकदा आपल्या नजरेखालून घालावे. पुराण कथाचे अभ्यासक देवदत्त पटनायक आपल्या शिवाची सात रहस्ये मध्ये म्हणतात की "मनात कसलीही कपटी भावना नाही म्हणून यांना भोलेनाथ म्हटले जाते ".शिवपार्वतीचा संयोग सत्तेच्या जोरावर नाही, कुणी विजेता नाही , विजय नाही दोघेही एकमेकांना सत्ता गाजविण्याची संमती देतात. एकमेकांवर शिरजोरी करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही हेच ते प्रेम आहे." मूर्तीशिल्पाच्या भावार्थ मधून हेच दिसून येते आणि आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या एवढ्या मोठ्या वैभवाचा आपण निश्चितच अर्थ लावला पाहिजे या शास्त्रामध्येच त्या काळाचे तत्त्वज्ञान व विचार दडलेले आहेत जे आपल्याला दिशा देणारे ठरतात.
https://shivjagars.blogspot.com/2023/09/blog-post.html
संजय खांडवे
9011971122
बुलढाणा



















































No comments:
Post a Comment