Monday, April 17, 2023

बारामती येथील सिध्देश्वर मंदिर

बारामती म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात ती इथली लांबच लांब शेते! तसं बारामती हे प्रसिद्ध मराठी कविवर्य मोरोपंतांचे जन्मगाव आहे. श्रीधर यांनी लिहिलेला शिवलीलामृत हा पवित्र ग्रंथ बारामतीचाच आहे.

खरं तर, बारामतीमधून द्राक्षे आणि साखर निर्यात केली जाते. बारामती आणि त्याच्या आसपास अनेक धार्मिक मंदिरे आहेत.

शेतीच्या खालोखाल इथलं मुख्य आकर्षण म्हणजे येथील मंदिरे!

श्री काशीविश्वेश्वर मंदिर, श्री. सिद्धेश्वर मंदिर, मोरगावचा गणपती, सिद्धटेकचा गणपती, जेजुरीचा खंडोबा बारामतीच्या आसपास आहेत.

आज आपण यापैकी सिद्धेश्वर मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत :

सुमारे 840 वर्षांपासून उभे असलेले हे मंदीर कऱ्हा नदीच्या पूर्व तीरावर आहे. असे म्हटले जाते की आपले गुरु मल्लिकार्जुन यांनी शिवलिंगांचा शहरभर प्रसार करावयास सांगितल्यामुळे श्री सिध्दरामेश्वरांनी स्वतः हे मंदिर बांधले.

शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे.

इ.स.1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले. चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत. समोरुन नंदीकडे पाहिले तर असं वाटतं की त्याचा एक कान तुमचं म्हणणं ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे.. जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो. या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते.

औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात. मंदिरामध्ये मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवलेली आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते. या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे.

नमोस्तुते !

 https://m.facebook.com/ShriSiddheshwarGaneshMandalBaramati/photos/a.407443792643547/407444009310192/?type=3&size=960%2C640&fbid=407444009310192

 https://mr.quora.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0?force_dialog=1

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...