८ ) hindi.livehistoryindia.com
९ ) etvbharat.com

>> आशुतोष बापट
गणेशाची देवस्थाने पाहताना आडेवाटेच्या दैवतांना जरूर भेट द्यावी.
सह्याद्रीच्या डोंगरांचे सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण
असलेल्या कोल्हापूर जिह्यातील इच्छापूर्ती गणेश आणि इंचनालचा गणेश ही
वेगळेपण दर्शवणारी गणेशस्थाने, ज्यांचे दर्शन घ्यायलाच हवे.
महाराष्ट्राच्या दक्षिणेचा जिल्हा कोल्हापूर आणि त्या कोल्हापूरच्याही
दक्षिणेला असलेले तालुके म्हणजे गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा. या तीनही
तालुक्यांना निसर्गाने भरभरून दिलेले आहे. सह्याद्रीच्या डोंगरांचे
सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण असे सगळे यथास्थित प्रकरण
आहे. या ठिकाणी आडवाटेवर फिरताना दोन सुंदर गणेशस्थाने बघावीत अशी आहेत.
त्यांचे स्थान, त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा आणि त्या ठिकाणाचे
नैसर्गिक महत्त्व यासाठी ही दोन ठिकाणे मुद्दाम वाट वाकडी करून बघावीत.
इच्छापूर्ती गणेश- एरंडोल आजरा
कोल्हापूर जिह्यातला आजरा तालुका निसर्गसौंदर्याने नटलेला आणि बहरलेला आहे.
हा सगळा प्रदेश खरं तर दुर्गम म्हणायला हवा. अतिशय रमणीय आणि गूढ असलेल्या
ह्या आडवाटेवरच्या प्रदेशात एक गणेशस्थान आहे एरंडोल इथे. हे
गणेशस्थानसुद्धा काहीसे गूढ म्हणावे लागेल. ही मूर्ती एरंडोल आजरा इथे
पोखरकर महाराजांच्या आश्रमात असलेल्या अष्टकोनी मंदिरामध्ये स्थापित केलेली
आहे. आश्रमात एक विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आणि जाबाली ऋषींची समाधीसुद्धा
आहे. भक्तांनी केलेल्या आर्थिक मदतीमधून हे मंदिर बांधलेले आहे. या
मंदिराला तळघर असून ध्यानधारणेसाठी तिथे बसता येते. अष्टविनायकांच्या
प्रतिमा आठ दिशांना या मंदिरात ठेवलेल्या आढळतात. गर्भगृहात सोळा हात
असलेली, उजव्या सोंडेची, पंचधातूची ही मूर्ती उभ्या स्थितीतली आहे.
मूर्तीचे सोवळे अत्यंत कडक असून पुजारी सोडून कोणालाही गर्भगृहात प्रवेश
करता येत नाही. ही मूर्ती इथे कशी आली याबद्दल एक चमत्कारिक कथा प्रसिद्ध
आहे. तांत्रिक साधना करणाऱया लोकांच्या वापरातली ही मूर्ती होती. चंबळ
इथल्या एका ऋषींच्या जवळ असलेली ही मूर्ती चंबळ-उज्जैन-तंजावर-गोकाक असा
प्रवास करत शेवटी संकेश्वर इथल्या रघुनाथशास्त्राr नामक महात्म्याकडे आली.
रघुनाथ शास्त्राr आजारी पडल्यावर ही मूर्ती एरंडोल आजरा इथले संत तुळशीराम
महाराज पोखरकर यांना द्यावी असा त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. त्यायोगे ही
मूर्ती एरंडोल इथे येऊन पोहोचली. मूर्तीचे तेज आणि तिची शक्ती सहन न
झाल्याने तिचा सुरुवातीला पोखरकर महाराजांना बराच त्रास झाला. परंतु
त्यांचे गुरु काशी येथील आत्मप्रकाशानंद यांनी स्वामींना आश्वस्त केले आणि
त्याचा त्रास बंद झाला. पुढे पोखरकर महाराजांच्या आश्रमातच हे मंदिर बांधून
तिथे मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी प्रसाद म्हणून नारळ फोडला जात नाही तर
गूळखोबरे आणि शेंगदाण्याचे लाडू देवापुढे ठेवले जातात. अनेक भाविकांची
इच्छा पूर्ण करणारा म्हणून याला इच्छापूर्ती गणेश म्हणतात, तर साधकांना मदत
करणारा म्हणून याला मोक्षदाता गणेश असेही नाव आहे. दर संकष्टीला कर्नाटक,
गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाविक दर्शनासाठी इथे येतात.
इंचनालचा गणेश
कोल्हापूर जिह्यातला गडहिंग्लज हा तालुका म्हणजे अनेक निसर्गरम्य ठिकाणे,
किल्ले, मंदिरे यांची रेलचेल असलेला प्रदेश आहे. खरं तर हा काहीसा
दुर्लक्षित भाग म्हणावा लागेल. पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध असूनही या
प्रदेशांबद्दल फारशी माहिती लोकांना नसते. भौगोलिकदृष्टय़ा सुद्धा हा प्रदेश
काहीसा वेगळा पडल्यासारखाच आहे. आंबोलीसारखे प्रसिद्ध गिरीस्थान इथून जवळ
आहे. गर्द झाडी, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि चंदगड, आजरा यासारखे
निसर्गसंपन्न तालुके यांचा शेजार लाभलेला हा भाग. गडहिंग्लजच्या पश्चिमेला
फक्त 7 कि.मी. अंतरावर इंचनाल नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य
लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर या
ठिकाणी गणेशाचे एक सुंदर मंदिर उभे आहे. या मंदिराला बराच इतिहास लाभलेला
आहे. इ.स. 1907-08 साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार श्री. गोपाळ
आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ
सेवा मंडळ, इंचनाळ, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून 1987 ते 1992
या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले. त्यासाठी गोकाकवरून
आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते 4
मे 1992 रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप,
बाजूला बगिचा, महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे हा. इंचनालच्या या
मंदिरातील गणेशमूर्ती बैठी असून तिची उंची अंदाजे सवा दोन फूट एवढी आहे.
काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते. चतुर्भुज
गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे. या
मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावानी जवळ जवळ 9 एकर
बागायती जमीन आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱया गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव
करतात आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा,
बेळगाव इथून भाविक यावेळी इथे दर्शनाला येतात. अत्यंत जागृत आणि नवसाला
पावणारे अशी ख्याती असलेले हे देवस्थान आहे. महागावचे दंडगे (जोशी)
घराण्याकडे गेल्या 300 वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली
आहे. कोल्हापूर-गडहिंग्लज येण्यासाठी बस सेवा विपुल आहे. मुद्दाम वाट वाकडी
करून पर्यटकांनी हा सगळाच परिसर फिरून पाहण्याजोगा आहे.
ashutosh.treks@gmail.com
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)
*|| ॐकारस्वरूपम शिवपुत्राय नमो नमः ||*
*|| ॐ गं गणपतये नमः ||*
*|| जय गणेश ||*
हे मंगलमूर्ती श्रीगजानना! विनायका! शिवपार्वतीसुता!
प्रथम आम्ही तुझ्या चरणांना मनोभावे वंदन करतो. तुझ्या प्रेरणेनेच आम्ही ग्रंथारंभ केला आहे. कार्यसिद्धीसाठी तू आम्हाला मंगलमय आशीर्वाद दे.
श्रीगणेश हा शिव-पार्वतीचा सुपुत्र होय. श्रीगणेशास सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. तो सुखकर्ता, दुःखहर्ता आहे. अशा या विनायकाचे पुराण पृथ्वीतलावर ऐकण्यास दुर्लभ आहे. तुम्ही सर्वजण भाग्यवंत आहात त्यामुळे ही सुवर्णसंधी तुम्हाला मिळाली आहे. गणेश पुराणाचे वाचन, श्रवण केल्याने यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य याची प्राप्ती होते. आम्हाला श्री गणेश जशी प्रेरणा देईल त्या प्रमाणे आम्ही हे गणेश महात्म्य तुम्हाला सांगणार आहे. आपण ते शांतचित्ताने, भक्तीमय अंतकरणाने, श्रद्धापूर्वक वाचावे ही नम्र विनंती. हे पवित्र पुण्यकारक गणेश पुराण प्रथम महर्षी व्यासांनी भृगूंना, भृगुनी सोमकांत नृपास व सोमकांत राजाने हे सर्व लोकांना सांगितले. उद्यापासून आपण उपासना खंडातील काही कथा बघणार आहोत.
नमस्कार!
गणपतीच्या दहा दिवसात (किंवा आयुष्यभरासाठी) आपण एक छोटासा नियम पाळणार आहोत. सकाळी अंघोळ झाली कि प्रत्येकाने खालील *संकटनाशक गणेश स्तोत्र* म्हणायचे आहे. कोणाच्या घरी सव्वा दिवसाचा गणपती असो अथवा पाच किंवा दहा दिवसाचा असो ,आपण हा नियम निदान दहा दिवस काटेकोरपणे पाळणार आहोत.
*|| संकटनाशन गणेश स्तोत्र ||*
प्रणम्यं शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ।।१।।
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ।।२।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।३।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ।।४।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो ।।५।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६।।
जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८।।
।।इति श्री नारदपुराणे संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम्।। श्रीगजाननार्पणवस्तू: ||
[25/08, 10:48 am] +91 83290 19361: *श्री गणेश पुराण कथा*
॥ श्री गणेशाय नम: ॥
*सोमकांत राजाची कथा*
सौराष्ट्र देशात देव नगरामध्ये फार फार वर्षापूर्वी सोमकांत नामक एक सत्वशील राजा होऊन गेला. तो वेदज्ञानी, धर्मनिष्ठ व प्रजादक्ष होता. त्याच्याजवळ कुबेराला ही हेवा वाटेल एवढे ऐश्वर्य होते. अशा या राजाचे पाच विश्वासू प्रधान होते. विद्याधीश, रूपवान, क्षमंकर,सुबल, ज्ञानगम्य अशी त्या पाच प्रधानांची नावे होती. हे सर्व प्रधान राजाप्रमाणे चतुरस्त्र होते. त्या सोमकांत राजास सत्वशील, सुविद्य, पतिव्रता पत्नी लाभली होती. सुधर्मा असे त्या राणीचे नाव होते. अशा या दांपत्यास देवाच्या कृपेमुळे एक बुद्धिमंत सुपुत्र लाभला होता. त्याचे नाव हेमकंठ. अशा या धर्मनिष्ठ ,प्रजादक्ष सोमकांत राजाला अचानक पूर्व कर्माप्रमाणे भयंकर कुष्ठरोग झाला. मनुष्याने केलेल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ त्याला व्यक्त किंवा अव्यक्त रुपाने त्याच जन्मी किंवा पुढील जन्मी मिळत असते.
कुष्ठरोगामुळे राजाला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. राजास वाटू लागले की आता आपल्या जीवनात रस नाही. त्यामुळे एके दिवशी राजाने आपले विश्वासू प्रधान ,सुपुत्र व प्रियतमा ला बोलावले व त्यांना आपली दुःखमय कहाणी सांगितली. सोमकांत राजा म्हणाला, “मी आजपर्यंत धर्माप्रमाणे आचार, विचार, उच्चार केले. मला पूर्वजन्मातील कर्म भोगावे लागत आहे. खरोखरच मानवी शरीर हे क्षणभंगुर आहे. केव्हा कोणता रोग या शरीरात उत्पन्न होईल हे काही सांगता येत नाही. या महारोगामुळे मला हे आयुष्य नकोसे झाले आहे. लोक कुचेष्टा करतात. त्यामुळे मला लोकांपुढे जाण्यास लाज वाटत आहे. मी आता ठरवले आहे की राजकुमार हेमकंठास राज्याभिषेक करून त्याच्याकडे संपूर्ण राज्यकारभाराची जबाबदारी सोपवायची. त्यानंतर मी वनात जाऊन परमेश्वराचे चिंतन करणार आहे.” राजाची प्रियतमा सुधर्मा म्हणाली, “स्वामी मी अग्नीसाक्षीने तुमच्याबरोबर विवाह केला आहे. तुम्हाला सर्वस्व अर्पण केले आहे. मी तुमच्या शिवाय राहू शकणार नाही. माझे पती परमेश्वर जिथे असतील तिथे मी येणार.”
आपल्या पिताश्रींचा दृढनिश्चय पाहून हेमकंठाने राज्यकारभार चालवण्याचे ठरवले. राजा हेमकंठास काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू लागला, “सदैव दुसऱ्याच्या कल्याणासाठी झिजावे. स्वतःचा स्वार्थ पाहू नये. दुसऱ्याची निंदा करणे किंवा त्याचा छळ करणे हे महापाप आहे. स्त्री, पैसा, मानसन्मान या गोष्टी लोकांपासून लपवून ठेवाव्या. अपेयपान करू नये. मुक्या प्राण्यांना ठार मारून त्यांचे मांस भक्षण करू नये व परधन, परस्त्रीबद्दल आसक्ती असू नये. सदैव धर्माप्रमाणे आचरण करावे हे लक्षात ठेव. राज्यकारभार करताना कोणी स्तुती करतील, तर कोणी निंदा करतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. राज्यकारभार करताना सदैव ईश्वराचे स्मरण असावे. यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सहा गुणांची वृद्धी करावी. तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या सहा दोषांपासून दूर रहावे.” अशा प्रकारे हेमकंठास सोमकांत राजाने एकांतात राजनीतीचा उपदेश केला.
त्यानंतर सोमकांत राजाने क्षेमकर, रूपवान व विद्याधिश या तीन प्रधानांना बोलावून राज्याभिषेकाची जय्यत तयारी करण्यास सांगितले. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सात पवित्र नद्यांचे पाणी आणले होते. राज्याभिषेकासाठी ब्राह्मण, नातेवाईक, मित्रमंडळी, देशोदेशीचे राजे आदींना निमंत्रणे देण्यात आली. प्रथम श्री गजाननाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुण्याहवाचन, मातृकापूजन, अभ्युदय, गंगार्पण इत्यादी धार्मिक विधी झाले. त्यानंतर सोमकांत राजाने स्वतःच्या करकमलानी हेमकंठाच्या मस्तकावर सुवर्ण राजमुकुट ठेवला. राज्याभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर सोमकांत राजाने ब्राह्मणांचे यथाविधी पूजन केले.
त्यानंतर सोमकांत वनवासात जाण्यासाठी निघाला. आपला अन्नदाता आपल्याला सोडून वनवासात चालला आहे हे कळल्यावर प्रजेला दुःख झाले. आपल्या जन्मदात्याचा विरह हेमकंठास सहन होईना. राजाने पुन्हा पुन्हा विनंती करून त्या लोकांना समजावले. हेमकंठाचा कंठ दाटून आला. हे बघून राजा सोमकांत म्हणाला, “आता तू माझी आज्ञा मानून नगरात परत जा व राज्यकारभार कर. तू पित्याची आज्ञा मोडता कामा नये. माझ्या या पाच प्रधानांनपैकी तीन प्रधानांना तुझ्याबरोबर ठेवतो. ते तुला मार्गदर्शन करतील. प्रजेचे प्रेमपूर्वक पालन कर. मी केलेल्या राजनीति प्रमाणे आचरण कर. मी जर पूर्ववत झालो, तर नक्की राज्यात परत येईल. तू काही काळजी करू नकोस.” आपल्या पिताश्रींच्या जड अंतकरणाने निरोप घेऊन त्यांच्या चरणांना वंदन करून हेमकंठ राजा आपल्या नगरीत जाण्यासाठी निघाला. नगरात जाण्याआधी हिमकंठाने आपल्या जन्मदात्रीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मदात्यांची आज्ञा मानून हेमकंठ पुन्हा आपल्या राज्यात आला. राजपुत्र पुन्हा राज्यात आल्याने सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. आपल्या वडिलांनी सांगितलेल्या राजनीतीप्रमाणे हेमकंठाने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.
हेमकंठास राज्याकडे पाठवल्यानंतर सोमकांत सपत्नीक, सुबल व ज्ञानगम्य या दोन विश्वासू प्रधानांसह निबीड वनात गेला. चौघेही एकमेकांच्या विचाराने वागत होते. प्रधान अरण्यात सुधा राजास मान देत होते. आपली पावले झपाझप पुढे टाकत ते एका सरोवराच्या तीरावर आले. त्या भागात अनेक ऋषी मुनींचे आश्रम होते. त्यांनी आश्रमासाठी निसर्गरम्य जागा निवडली होती. त्या आश्रमातले ऋषींचे शिष्यगण तसेच ऋषी सुद्धा सरोवरातील मधुर पाणी व कमळे नेण्यासाठी येत असत. त्यांना येथे मुक्त वातावरण लाभले होते. आपण जणू काही स्वर्गातच आलो आहोत असे त्यांना वाटत होते.
खूप चालून चालून सोमकांत राजाचे पाय दुखत होते. त्यामुळे त्याची प्रियतमा त्याचे पाय चेपीत बसली. त्यानंतर दोन्ही प्रधान पोटपूजेचा बंदोबस्त करण्यासाठी कंदमुळे व सुमधूर फळे आणण्यासाठी अरण्यात निघून गेले. सोमकांतला झोप लागली. सुधर्मा मात्र जागीच होती. तिला तळ्याजवळ एक पिळदार शरीरयष्टी असलेला तेजस्वी ऋषिकुमार दृष्टीस पडला. त्याला बघताच सुधर्मा चा आनंद गगनात मावेना. हा तेजस्वी महात्मा आपले कल्याण करण्यासाठी येथे आलेला आहे असे तिला वाटले. सुधर्माने त्या तेजस्वी ऋषीपुत्रास हाक मारली. तो ऋषिकुमार सुधर्माकडे आला व त्याने तिला वंदन केले. सुधर्मा म्हणाली, “हे तेजस्वी ऋषीपुत्रा तू कोण आहेस?” तिचा प्रश्न ऐकून ऋषिकुमार म्हणाला, “हे माते! माझे नाव चवण आहे. माझ्या पिताश्रींचे नाव भृगु ,मातोश्री चे नाव पुलोत्तमा आहे. कृपया आपला परिचय द्यावा. सुधर्मा म्हणाली, “हा पुरुष म्हणजे सोमकांत राजा होय. मी त्याची धर्मपत्नी सुधर्मा. सोमकांत राजाच्या पूर्व कर्मामुळे त्याला कुष्ठरोग झाला आहे. विवाहनंतर त्यांना कुष्ठरोग झाला आहे. आता या भयंकर रोगातून माझ्या पतीचा उद्धार कसा होईल हे मला समजत नाही.” सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून चवणास वाईट वाटले. तो तेथून काहीही न बोलता गेला व आपल्या कलशात जल भरून आश्रमात आला.
आपल्या पिताश्री समोर त्याने तो पाण्याने भरलेला कलश ठेवला व खाली मान घालून उभा राहिला. आपल्या सुपुत्राचे काहीतरी बिनसले आहे, त्याला कसलेतरी दुःख झाले आहे हे भृगु ऋषींनी ओळखले. चवनाने जन्मदात्यास सोमकांत राजाची सर्व हकीकत सांगितली. भृगू ऋषी म्हणाले, “अरे, तू यामुळे एवढा दुःखी का झालास? त्या सर्वांना घेऊन तु आश्रमात ये. आपण त्यांचे दुःख निवारण करू.” पिताश्रींच्या आज्ञेनुसार चवन पुन्हा सरोवरापाशी आला. भृगुपुत्र चवन सुधर्मास म्हणाला, “हे राजनंदिनी! माझ्या पिताश्रींनी आपणासर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे.” चवनाचे हे संभाषण ऐकून सुधर्मास आनंद झाला. ते पाचही जण ऋषींच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. अशाप्रकारे ती सर्व मंडळी ऋषींच्या आश्रमात आली. त्यांच्या शिष्यांनी सोमकांत राजा ,सुधर्मा राणी व दोन प्रधानांचे सहर्ष स्वागत केले. आश्रमात सर्वत्र वेदघोष सुरू होता. आश्रमात अनेक हिंस्त्र पशु सुद्धा होते. ते एकमेकांशी हाडवैर विसरून मुक्तपणे हिंडत होते. तेथे सुशितल पवन होता. त्या आश्रमात भृगुऋषी व्याघ्रचर्मवर शांत चित्ताने बसले होते. त्यांची मुद्रा तेजस्वी दिसत होती. त्यांचे दर्शन झाल्यावर सर्वांनी त्यांना नमस्कार केला. भृगु ऋषींनी सर्वांना मंगलमय आशीर्वाद दिले.
नंतर सोमकांत राजा पुढे आला व हात जोडून नम्रपणे म्हणाला, “हे मुनिवर, आपली कीर्ती त्रैलोक्यात पसरली आहे. माझे भाग्य थोर म्हणून आज मला आपले दिव्य दर्शन झाले. स्वामीजी माझ्याकडे कशाची कमतरता नव्हती. मी माझ्या जीवनात सदैव सत आचार, सत विचार, सत उच्चाराचे पालन केले. मी शंभू महादेवाची भक्ती सुद्धा केली. असे असून सुद्धा मला कुष्ठरोग झाला. आपणच मला या दुर्धर व्याधीतून मुक्त करा. आपण शिग्रतेने काहीतरी उपाययोजना करावी. मला या रोगाचा कंटाळा आला आहे. काही काही वेळा आत्महत्या करावी असे वाटते, पण आत्महत्या पाप आहे याची जाणीव असल्याने मी मनाला समजावतो. आता तुम्हीच मला या दुर्धर रोगापासून मुक्त करा, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे.”
सोमकांत राजाची विनंती ऐकून तपस्वी भृगु ऋषी म्हणाले, “राजन, तू काळजी करू नकोस. आपल्या सर्वांचे काळजी घेणारा परमेश्वर आहे. त्याच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. मला तुझे परम दुःख कळाले आहे. माझ्याकडे त्यावर जालीम औषध सुद्धा आहे. हे सर्व तुला पूर्वजन्मीच्या भयंकर पापामुळे भोगावे लागत आहे. ईश्वर सर्वांना सर्व कर्माची फळे व्यक्त-अव्यक्त रूपात देत असतो. मनुष्याने सदैव ईश्वराचे स्मरण करावे. त्यामुळे त्याच्या हातून नेहमी चांगलीच कर्मे होतात. तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या शत्रूंवर विजय मिळवता आला पाहिजे. तू पूर्वजन्मी कोणते महापाप केले होतेस, हे मी तुला दिव्य दृष्टीने सांगेन. तू आता निवांत हो.” भृगु ऋषींच्या संभाषणाने सुधर्मास हायसे वाटले. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजन झाल्यानंतर सर्वजण निद्राधीन झाले. सोमकांत राजास झोप केव्हा लागली हे सुधर्मास कळले सुद्धा नाही. एवढा परमानंद सोमकांत राजास राजवाड्यात असताना सुद्धा झाला नव्हता.
त्या रात्रीनंतर भृगु ऋषी प्राप्त:काळी उठले. त्यांनी आपल्या एका शिष्याकडून सोमकांत राजास बोलावले आणि आपल्या दिव्य दृष्टीने सोमकांत राजाचे पूर्वजन्माचे चरित्र सांगण्यास प्रारंभ केले. ते म्हणाले, “फार फार वर्षापूर्वी विंध्यपर्वता जवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. या नगरीत एक धनाढ्य वैश्य राहात असे. त्याचे नाव होते चिद्रूप. त्याला सुविद्य, सुशील, पतिव्रता प्रियतमा लाभली होती. तिचे नाव शुभगा. त्यांना खूप वर्ष झाली तरी मुलबाळ नव्हते. त्यांना देवाच्या कृपेमुळे वृद्धापकाळी एक पुत्र लाभला. त्यांनी त्याचे नाव कामंदा ठेवले. त्याच्या आई-वडिलांना त्याचे फार लाड केले. त्याला लाडाने वेडे केले. त्याने आई-वडिलांच्या संमतीशिवाय एका तरुणीशी विवाह केला. ती तरुणी दिसायला लावण्यवती होती. त्यांनी आपल्या लाडक्या सुनेचे नाव कुटुंबिनी असे ठेवले. ती पतिव्रता होती. अशा या थोर पतिव्रता स्त्रीस सात पुत्र व पाच कन्या लाभल्या. या मुळे चिद्रूप व त्याच्या पत्नीस आनंद झाला. ते दोघेही वृद्धपणी नातवंडांच्या बाललीलात रमू लागले. काही दिवसांनी दोघेही गतप्राण झाले.
आई-वडिलांच्या निधनानंतर सर्व संपत्ती कामंदाच्या हाती आली. कामंदाला संपत्तीचा गर्व झाला. त्याने अविचाराने संपत्ती उडविण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्या धर्मपत्नीने त्याला खूप समजावून सांगितले, पण त्याने ऐकले नाही. थोड्या दिवसातच कामंदा संपत्तीरहित झाला. तो अनेक प्रकारची कट-कारस्थाने करू लागला. लोकांना फसवू लागला. तो अपेयपान करू लागला. अशा या स्त्रीलंपट, लबाड कामंदाच्या हरकती मुळे जनता त्रस्त झाली. कामंदा विरुध्द नृपाकडे तक्रार केली. त्याची शिक्षा म्हणून राजाने कामंदास नगराबाहेर हाकलून दिले. त्याने अरण्यात मुक्काम ठोकला.
अरण्यात येणाऱ्या वाटसरूंना लुटून तो ठार मारत असे. तो अरण्यातील पशु पक्षांना ठार मारून आपले पोट भरू लागला. असे करता करता त्याच्या जवळ अमाप संपत्ती जमा झाली. त्याने अरण्यात मोठे घर बांधले. हाताखाली दहा गुंडांना कामासाठी ठेवले. त्यांच्या हातून अनेक ब्रम्हहत्या झाल्या होत्या. त्याच्या तारुण्याचा जोम हळूहळू कमी होऊ लागला. त्याने प्रौढत्वात पदार्पण केले. प्रौढत्वात सुद्धा त्याने अनेक लोकांची निर्घृण हत्या केली. निसर्ग नियमाप्रमाणे त्याने प् प्रौढत्वातून वार्धक्यात पदार्पण केले. वार्धक्यात त्याला धड चालता येईना, बोलता येईना. हात पाय थरथरू लागले. त्याच्या नोकर-चाकराना, तसेच पुत्रांना, मित्रमंडळींना हा केव्हा एकदा देवाघरी जातोय असे वाटू लागले. त्याला अचानक एका ब्राह्मण सख्याची आठवण झाली. त्या सख्यास सांगून इतर ब्राह्मणांना कामंदाने आपल्या घरी बोलावले.
त्याने ब्राह्मण समुदायास प्रथम नमस्कार केला व म्हणाला, “हे ब्राह्मण जनहो, माझ्या हातून अनेक पापे झाले आहेत. मला मरणापूर्वी पुण्यकर्म करायचे आहे. त्यामुळे मी आपणा सर्वांना शंभर सुवर्णमुद्रा दान करणार आहे.” त्या ब्राह्मण समुदायातील दोन ब्राह्मण म्हणाले, “शिवं शिवं! अरेरे ! तुझ्यासारख्या महापापी चांडाळाकडून आम्ही दान स्वीकारणार नाही.” ब्राह्मणांकडून नकार मिळाल्यानंतर कामंदास आपल्या हातून केवढे महापाप झाले आहे याची जाणीव झाली. कामंदा ज्या अरण्यात राहत होता, त्या घनदाट अरण्यात एक श्री विनायकाचे जुने देऊळ होते. ते देऊळ खूप वर्षापूर्वींचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार करून आपण पुण्यप्राप्त करावे असे कामंदाने ठरवले. त्यानंतर ताबडतोब आपल्या जवळ असलेल्या सर्व पैशांनी जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. त्यांनी अत्यंत मनमोहक मंदिर बांधले. अशाप्रकारे कामंदाचे होते तेवढे बहुतेक धन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात खर्च झाले. उरलेले सर्व धन नातेवाईकांनी पळवून नेले. नातेवाईकांना मानसन्मानाची, पैशाची अपेक्षा असते. जरा काही चूक झाली की ते पिसाळलेल्या सिंहाप्रमाणे भांडण्यासाठी येतात. मनुष्याने परमेश्वराची थोडीजरी भक्ती केली तरी तो परमेश्वर आनंदित होतो. त्याला शुद्ध प्रेमाची अपेक्षा असते.
काही महिन्यानंतर कामंद देवाघरी गेला. प्रथम यमदुतांनी त्याला चाबकाचे फटके दिले, दगडांनी मार मार मारले, उकळत्या तेलाच्या कढईत फेकून दिले. यमाने चित्रगुप्तास विचारले कि याचे पापपुण्य किती आहे? चित्रगुप्ताने आपल्या नोंदवहीत पाहिले व सांगितले, याचे पाप खूप आहे, त्यामानाने पुण्य थोडे आहे. यमाने कामंदास विचारले की, प्रथम पुण्य भोगणार की पाप भोगणार लवकर सांग. कामंदा म्हणाला, यममहाराज मला प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा आहे. त्यामुळे यमाने त्याला सौराष्ट्र देशातील राजघराण्यात जन्माला घातले. तोच महापापी कामंदा म्हणजे तू आहेस राजन. तुझ्या पुण्याईमुळे तुला हा जन्म लाभला आहे.” हि पूर्वजन्मीची कथा भृगु ऋषींनी राजास सांगितली.
भृगु ऋषींनी आपल्याला खोटेच सांगितले असे सोमकांत राजास वाटू लागले. तेवढ्यात एक अद्भुत चमत्कार झाला, अचानक घारी सारखे मोठे पक्षी येऊन सोमकांत राजास आपल्या चोचीने मारू लागले. ऋषी म्हणाले, “हे राजन, ऋषीमुनी असत्य भाषण करीत नाही. असे असताना तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, त्यामुळे हे पक्षी तुला त्रास देत आहेत.” असे म्हणून ऋषींनी एकदा हुंकार देताच ते पक्षी निघून गेले. त्यानंतर सोमकांत राजाने भृगु ऋषींना साष्टांग नमस्कार करून त्यांची क्षमा मागितली. तपस्वी, महाज्ञानी भृगु ऋषींनी नंतर क्षणभर ध्यान केले. या ध्यानामध्ये त्यांनी सोमकांत राजाच्या पूर्व कर्माचे अवलोकन केले व पुढे म्हणाले, “हे राजन, तुझे पूर्वजन्मीचे पाप खूप आहे. तू पूर्वजन्मी अनेक महापापे केली आहेस. त्यामुळे ती सर्व पापे नष्ट करण्यासाठी कोणताही उपाय उपयोगी पडणार नाही. पण एक रामबाण उपाय आहे. तू पुण्यमय गणेश पुराणाचे भक्तीमय अंतकरणाने श्रवण केल्यास पापक्षालन होईल, यात काहीही शंका नाही. तो श्री गणेश सुखकर्ता आहे तसेच दुःखहर्ता आहे”
असे म्हणून भृगु ऋषींनी आपल्या कमंडलूस स्पर्श करून एक सहस्त्र गणेशाचे नावे उच्चारली. त्यानंतर त्या कमंडलूतील मंतरलेले जल सोमकांत राजाच्या अंगावर शिंपडले. त्यानंतर राजाच्या नासिकाग्रातून एक अत्यंत सूक्ष्म पुरुष बाहेर पडला. थोड्याच कालावधीत तो एवढा वाढला की त्याची उंची सात वृक्ष पेक्षा जास्त झाली. तो माणूस अत्यंत काळाकुट्ट होता. त्याच्या मुखातून रक्त,पु यांसारखे अनेक पदार्थ बाहेर येत होते. हा अक्राळविक्राळ मनुष्य आपणास यमलोकी पाठवणार असे त्यांना वाटू लागले. भृगु ऋषी घाबरले नाहीत. त्यांनी मोठ्या धिराने त्या मनुष्यास विचारले, “हे राक्षसा, तू कोण आहेस?” तर राक्षस म्हणाला, “मी पुण्यपुरुषांचा जुळा भाऊ पापपुरुष आहे. मी प्रत्येक मनुष्याच्या शरीरात राहत असतो आणि सात्विक आचरणाचे माणसे असतात ती माझ्या भावाचे ऐकतात. जी राजस आचरणाची माणसे असतात ती आमच्या दोघांचेही ऐकतात व जी पापी माणसे म्हणजे तामसी आचरणाची माणसे असतात ती फक्त माझे ऐकतात. माझ्या ऐकल्यामुळे अनेक पापी लोकांचा नाश झाला आहे. आपल्या मंत्र प्रभावाने मी राजाच्या शरीरातून बाहेर आलो.” त्या राक्षसाचे बोलणे ऐकून भृगू ऋषी म्हणाले, “आता मी सांगतो तेथे जा. पुन्हा येथे येऊ नकोस. समोर जो आम्रवृक्ष आहे त्याच्या ढोलीत जाऊन बस व झाडांची वाळलेली पाने खाऊन पोट पूजा कर.” राक्षस गेला त्याने आम्रवृक्ष स्पर्श करताच त्या झाडाचे भस्म झाले. त्यावर भस्माच्या ढिगात तो लपून बसला.
हे पाहून ऋषी म्हणाले, “राजन, तू अतिशय पुण्यकारी पुण्यवर्धक श्री गणेश पुराण शांतचित्ताने श्रवण कर. म्हणजे त्या दिव्य पुण्याइने आम्रवृक्ष पूर्ववत होईल व तू पापातून मुक्त होशील.” सोमकांत राजा म्हणाला, “मुनीवर, मी श्रीगणेश पुराण कोठेही पाहिले नाही किंवा श्रवण सुद्धा केले नाही. मी श्री गणेश पुराण ऐकण्यासाठी कोणाकडे जाऊ? याचे तुम्ही मार्गदर्शन करा.” ऋषी म्हणाले, “हे वत्स ! तुला श्रीगणेश पुराण श्रवण करण्यासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. पूर्वी विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवांनी हे पुण्यमय पुराण महर्षी व्यासांना सांगितले. मी स्वतः महर्षी व्यासांकडून श्रवण केले आहे. तुझी तीव्र इच्छा असेल तर मी ते सांगण्यास तयार आहे. पण तू ते श्रद्धापूर्वक ऐकले पाहिजे. प्रथम तू सरोवरात जाऊन स्नान करून ये.” त्यानंतर सोमकांत राजा सरोवरावर गेला. तेथे स्नान केले. ओंजळीत जल घेऊन सूर्यनारायणाच्या साक्षीने गणेश पुराण श्रवण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर ते जल सरोवरास अर्पण केले. त्या संकल्पामुळे राजाचा दुर्धर असा कुष्ठरोग ताबडतोब बरा झाला. आसनावर बसल्या नंतर सोमकांत राजा म्हणाला, “श्रीगणेश पुराण खरोखरच दिव्य आहे. ते ऐकण्याचा मी आज संकल्प केला व ताबडतोब माझे शरीर रोगमुक्त झाले. शिवपार्वतीसुत खरोखरच सुखकर्ता व दु:खहर्ता आहे.” ऋषी म्हणाले, “बरे झाले तुझी तुलाच खात्री पटली.हे पुण्यमय श्रीगणेश पुराण जे वाचतील वा श्रवण करतील त्यांची जन्मजन्मांतरी पापे नष्ट होऊन जातील. त्यांच्या घरात सुख, शांती, समाधान नांदेल. या गणेश पुराणाचे श्रवण वाचन केल्यामुळे कलियुगात मनुष्यप्राणी भवसागरात तरून जाईल. त्यामुळे मी आता गणेश पुराण सांगण्यास प्रारंभ करतो.”
भृगू ऋषी सांगू लागले, “नारायणाच्या एका अंशापासून महर्षी व्यास निर्माण झाले. महर्षी व्यास महान तपस्वी तसेच ज्ञानी सुद्धा होते. त्यांनी एका वेदाचे चार विभाग केले. ते चार विभाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. हे चार वेद मनुष्याने समजावून घेतले पाहिजेत ,त्यांनी वेदाचे ज्ञान समजावून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी त्यांनी पुराने रचण्यास सुरुवात केली. त्यांना ज्ञानाचा गर्व झाला होता. आपल्यासारखा ज्ञानी पुरुष या त्रैलोक्यात कोणीही नाही असे त्यांना वाटू लागले. पुराने रचण्यापूर्वी आपली दिव्य रचना निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून त्यांनी श्री गजाननाचे किंवा इतर कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली. त्यांना आपण पुढे काय लिहावे हे सुचेना. त्यांना स्मृतिभ्रंश होऊ लागला. काही आठवेना.
याचे कारण विचारण्यासाठी ते विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी थोडा विचार केला व म्हणाले, “हे वत्सा ! कोणतेही कार्य हाती घेण्यापूर्वी त्याचा सर्वांगाने विचार केला पाहिजे. कोणत्याही कार्य करताना मनामध्ये नम्रता असावी. गर्वाने कोणत्याही कार्यास सुरुवात केल्यास अनेक विघ्नांचा सामना करावा लागतो. आपण त्रैलोक्यात ज्ञानी आहोत असा तुला गर्व झाला होता, त्यामुळे शारदा तुझ्यावर चिडली व तुझी मती कुंठीत झाली. तू कोणतेही कार्य करण्यापूर्वी मंगलमूर्ती श्री गजाननाचे स्मरण करत जा. श्री गणेश सहस्त्रनामावलीने गणेशाची पूजा करत जा. श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे. कोणत्याही कार्याच्या प्रसंगी, प्रथम श्री गणेशाचे पूजन करणे आवश्यक आहे. त्याला सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. प्रत्येक मनुष्याने रोज स्नान केल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र किंवा श्री गणेश सहस्त्रनामावली म्हणणे आवश्यक आहे. ज्या मनुष्यावर मंगलमूर्ती प्रसन्न असतो, त्याच्यावर सर्व देवदेवता संतुष्ट असतात. आता तू आश्रमात जाऊन प्रथम श्री गणेशाचे पूजन कर. त्याच्या कृपेने तुझी बुद्धी पूर्ववत होऊन तुला पुराण लिखाणास प्रारंभ करता येईल.” ब्रह्मदेवांचा उपदेश ऐकल्यानंतर श्री महर्षी व्यास म्हणाले, “हे करुणासागरा, माझी मती कुंठित झाल्याने मला स्मृतिभ्रंश झालेला आहे. त्यामुळे हा शिवपार्वतीसुत श्रीगणेश कोण? त्याचे सहस्त्रनाम कोणकोणती आहेत? त्याच्या वेगवेगळ्या भक्तांच्या कथा सुद्धा आपण मला सांगाव्यात. त्याने घेतलेल्या विविध अवतारांबद्दल सुद्धा मला सर्व काही सांगा.”
[25/08, 10:48 am] +91 83290 19361: *श्रीगणेश*
भाग १.
सुमारे पांच सात हजार वर्षापुर्वी पाताळातील रत्नपुरीत काशीराजाचे राज्य होते. विद्वान कश्यपत्रृषी व पत्नि आदिती हिमालयाच्या पायथ्याशी राहत. त्यांच्या गुरुकुलात २१०० बटु शिक्षण घेत होते. ते काशीराजाचे गुरु होते. आदिती पतिव्रता असुन सुर्योपासक होती. त्यांना लग्नाच्या पांच वर्षानंतर मुलगा झाला. त्याचे नांव विनायक ठेवले. विनायक रुपाने वेगळाच होता. सावळा रंग, बारीक डोळे, हत्तीसारखे कपाळ... तरीही तो आपल्या गुणांनी सर्वांचा आवडता होता.
महर्षी पराशरने विनायकाचे भाकीत सांगतांना म्हणाले, विनायक दिसायला जरी विचित्र असला तरी मनानं अतिशय सुंदर आहे. तो आर्यभूचा नायक होऊन पराक्रमी नेतृत्व करणारा बुध्दीमान होईल. सर्व देवतांमधे याला अग्रपुजेचा मान राहिल.
विनायक सहा वर्षाचा झाल्यावर त्याच्या मुंजीसाठी अनेक त्रृषी, कैलासाहुन शंकर, स्वर्गातुन इंद्र, बद्रिकाश्रमातुन व्यास आणि पाताळातुन काशीराजही आलेत. अरुंधती, रेणुका इतर अनेक देवताही आल्यात. मौजीबंधनानंंतर विनायकाने गुरुसमोर शपथ घेतली की, वेदविद्येचा अभ्यास करीन. माता-पिता आणि गुरु यांना मान देईन. देव, देश, धर्म यासाठी प्रसंगी प्राण सुध्दा अर्पण करीन. नंतर कश्यपांनी गायत्रीमंत्र, रेणुकेने परशू, शंकराने त्रिशूल व डमरु, व्यासांनी महाभारताचा पहिला पर्व, माहेश्वरीने २१ मोदक, अश्विनीकुमारांनी २१ दुर्वा आणि सर्वांनी बटुला अशिर्वाद दिला.
नंतरच्या सहा वर्षात विनायकाने चारही वेदाचा अभ्यास पुर्ण केला. आश्रमातील सर्व प्रकारची कामे मग ती कोणत्याही दर्जाची असो मनोभावे करीत असत. उरलेल्या वेळात सूत कातुन स्वतःचे वस्र विणत असे. त्याच्या मते अन्न, वस्र निवारा याबाबतीत स्वावलंबी होऊन आरोग्य, शील, बुध्दी सतेज व्हावी.
विनायकाची नम्र वागणूकीने तो सर्वांचा आवडता तर झालाच शिवाय २१०० बटु त्याला नायक मानुन त्याच्या आज्ञा पाळत. एकदा सर्व बटुंना एकत्रीत करुन २१- २१ च्या गटाने ऊभे करुन प्रत्येकाला प्रत्येकाला हुद्दाही ठरवुन दिला. एकवीस गणांचा मुख्य तो गणपती, २१ गणपतीचा मुखय तो गणेश, २१ गणनायकांचा शास्ता तो गणनाथ, २१ गणनाथांचा नियंता तो गजानन आणि २१ गजाननांचा नेता तो महागणपती. अश्या प्रकारे गटागटांनी शिस्तबध्द गण-सैन्य तयार झाले.देशात या कल्पनेचा प्रसार झाला. विनायक महागणपती बनला.
विनायकाने कल्पकतेने "ऐरावत" नावाचे नाटक लिहुन त्याचा प्रयोग सादर केला. सर्वांना खुप आवडल्यामुळे त्याची खुप प्रशंसा केली. आठवण म्हणुन महागणपतीने आपल्या ध्वजावर गजराजाचे चिन्ह ठेवलं.
बटुंचे आश्रमातील विद्याभास पुर्ण झाल्यावर ते आपापल्या गावी गेलेत, पण विनायकाच्या सुचनेनुसार त्यांनी सुर्योपासक सैन्य वाढवण्याचा उपक्रम सुरु ठेवला. काशीराजास फार मोठा आधार मिळाला. महागणपतीची किर्ती सर्वत्र पसरली. कश्यप-अदितीस धन्यता वाटली.
वेदांचं शिक्षण संपल्यावर विनायक अमरावतीजवळ अश्विनीकुमारांच्या आयुर्वेद विद्यालयात सहा वर्षे आयुर्वेदाचा अभ्यास केला. तिथल्याही विद्यार्थ्यांना सूर्योपसकाची दिक्षा दिली.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख
[25/08, 10:48 am] +91 83290 19361: *श्रीगणेश*
भाग २
आयुर्वेदाच्या अभ्यासाने दुर्वा, शमी, आघाडा, मंदार, तुळस, बेल इत्यादी ह्या साध्या वनस्पतीने असाध्य रोगही बरे होतात हे समजल्यामुळे याचा उपयोग जनहितासाठी करण्याचा संकल्प केला. स्वतः तो २१ दुर्वांचा रस पिऊ लागला. आयुर्वेदाचे शिक्षण संपल्यावर आर्यवर्तात उत्तर धृवापासुन विषुवृत्तापर्यत फिरुन २१ गणराज्याची स्थितीचे अवलोकन केले. प्रत्येक राज्याचा ध्वज निराळा होता... व्याघ्र, सिंह! वराह, मूषक, व षभ, गज यावरुन त्या त्या गणराज्यास गजध्वज, मूषकध्वज अशी नांवे दिल्या गेली.
आर्यावर्ताच्या बाहेर असूर व राक्षस या जाती होत्या. त्या जाती सतत भारतखंडावर हल्ले करुन खुप त्रास देत असे आणि पराभवानंतर पळून जात. असुरांच्या राज्याची श्रृंभा नांवाची राणी होती. तिचा मुलगा नरांतक हा अतिशय क्रुर व आसुरी सत्तेचा अर्क होता. श्रृंभेचे स्वप्न होते की, हिमालयाच्या पलीकडील भारतावर आक्रमण करुन संपती लुटुन तेथी २१ राज्यं जिंकुन आपले राज्य वाढवावे. अार्यांना आसुरी सत्तेपुढे नमवुन सूर्योपासक धर्माचा निःपात करावा या महत्वाकांक्षेने तीने नरांतकाला तयार केले.
आर्यांच्या गणराज्यातील फुटीरतेचा फायदा घेऊन नरांतकाने काशी राज्याचे गणराज्य सोडुन संबंध आर्यवर्त जिंकुन सिंधपुरला राजधानीची स्थापना केली. नरांतकाच्या काळ्या रंगाच्या निशानावर ३२ दातांचा दंतध्वज फडकवुन मोठ्याने गर्जना करुन म्हणायचा, "जो कोणी माझ्या विरोधात राहिल त्याला या ३२ दातांखाली चावुन खाईन."
सगळीकडे एकछत्री अंमल स्थिरावल्यावर नरांतकाने मांडलीक राजांसाठी हुकुमनामा काढला, त्यात... सूर्यमंदिरातील सूर्याच्या मुर्ती काढुन टाकणे, श्रृंभादेवीची पुजा, तरुण रुपवान कन्या असुर तरुणांना देणे, सुवर्णालंकार न घालणे, सिंधपुरच्या खजीन्यात सर्वांनी सोने जमा करणे... या कडक अंमलबजावणीमुळे आर्यवर्ताला प्रेतकळा आली होती. सुवर्णमंदिरे भ्रष्ट झालीत, रुपसुंदर तरुणींनी आत्महत्या केल्यात. राक्षसांनी नुसता धुमाकुळ घालुन दंतध्वजाचे राक्षसी सैन्य प्रजेला प्रचंड दाताखाली भरडुन काढू लागले.
नरांतकाच्या नाशासाठी नरनारायणाचा कोणी तरी अवतार घ्यावा यासाठी जनता सूर्यदेवाला आवळू लागली, मनोभावे प्रार्थना करुं लागली. ज्वलंत उपासना व आर्त प्रार्थना सूर्यमंडलास जाऊन भिडली. त्या प्रार्थनेचे फळ म्हणुन महामुनी कश्यप आणि धर्मपरायण अदितीच्या पोटी विनायकाने जन्म घेतला. त्याचा प्रभाव अठरा वर्षापर्यत आर्यांना दिसला नाही. पण... नरांतकाचे अत्याचार महागणपतीला समजल्यावर तो खूप संतापला परंतु अजुन वेळ यायची होती. एकवीस कोटी गायत्रीमंत्राचा जप करुन अस्रविद्या हस्तगत होईतर्यत नरांतकांच्पा अत्याचाराचा कळस होऊ देत, जनता भरडल्या गेल्यामुळे चीड निर्माण झाल्यावरच ते संघटीत होऊन मदत करण्याची भावना निर्माण झाल्यावरच नरांतकाचा पराभव करणे सुलभ होईल.
त्रिशुलधारी सूर्यापासक गणांच सैन्य वाढत आहे ना, याकडे महागणपतीचे पुर्ण लक्ष होते. भूतानमधल्या गौरुशंकाराच्या 'पाशुपात" नांवाच्या अस्रविद्यालयात विद्यालयात विनायकाने २१०० बटुसहित अस्रविद्या अध्ययन व यज्ञयाग शिकण्यासाठी प्रवेश घेतला. महागणपतीने हटयोग, अस्रविद्या अवगत केली. त्याची धारणाशक्ती आणि गुरुभक्ती पाहुन शंकर प्रसन्न, संतुष्ट होऊन विनायकाला आपला पुत्र मानले.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
*श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
*सृष्टीनिर्मितीसाठी ब्रम्हदेवांस श्रीगणेशाचे आशीर्वाद*
ब्रह्मदेव महान तपस्वी व्यासांना म्हणाले, “हे वत्स! मंगलमूर्ती गजाननास प्रसन्न करण्याचे अनेक मंत्र आहेत. ज्या मंत्रांमुळे सिद्धी लवकर प्राप्त होते व ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सहा सद्गुणांची प्राप्ती होते. असा मंत्र मी तुला सांगतो. गणेश मंत्रात एकूण सात कोटी महामंत्र सांगितले आहेत. त्या मंत्रांचे दिव्य रहस्य गणेश पित्यास म्हणजेच देवाधिदेव महादेवास व मला माहित आहे. महामंत्रांपैकी षडाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. अनुष्ठान करणाऱ्याचे अंतकरण प्रथम सात्विक असावयास हवे. त्याचा आहार ही सात्विक हवा. अनुष्ठान करणाऱ्या गणेश भक्ताने प्रथम अभ्यंगस्नान करून शुचिर्भूत व्हावे, नंतर सोवळे नेसून दर्भासन किंवा त्यासारख्या शुद्ध आसनावर मनात कोणताही विकल्प न आणता बसावे. नंतर ॐ केशवाय नमः | ॐ नारायणाय नमः | ॐ माधवाय नमः | असा नामोच्चार करत आचमन करावे. त्यानंतर प्राणायाम करावा. श्रीगजाननाच्या पवित्र चरणकमलांपासून मस्तकापर्यंतच्या दिव्य स्वरूपाचे हृदयात ध्यान करून मानसपूजा करावी.” अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. महर्षी व्यासांना समाधान झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचे आभार मानले.
*एकाक्षरी मंत्र* : ॐ गं ॐ
*षडाक्षरी मंत्र* : ॐ वक्रतुण्डाय हुं ॐ
देवाधिदेव ब्रह्मदेवाकडून ही फलश्रुती ऐकून व्यासांना परमानंद झाला. ते ब्रह्मदेवास म्हणाले, “हे वात्सल्यमूर्ती ब्रह्माजी, आपण जे काही आत्ता सांगितले ते ऐकून माझे कान तृप्त झाले. या मंत्राचा महिमा विलक्षण आहे. किती ऐकले तरी मला समाधान होत नाही. त्यामुळे या दिव्य मंत्राच्या सहाय्याने कोणती सिद्धी प्राप्त झाली हे मला सांगा”, त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी व्यासांना खालील माहिती दिली.
सृष्टी निर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवावर पडल्यावर त्यांना ही सृष्टी कशी निर्माण करावी याबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यावेळी त्यांनी गणेशाची प्रार्थना केली की, “हे विघ्ननाशका, सृष्टी निर्मितीबाबत मी अज्ञानी आहे. मला याबाबतीत मार्गदर्शन करावे.” तेव्हा विनायक म्हणाले, “हे काम वाटते तेवढे अवघड नाही. माझ्या देहात सर्व ब्रह्मांड आहे, ते ब्रह्मांड एकदा तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व कल्पना येईल.” त्यानंतर श्रीगणेशाने ब्रह्मदेवास आपल्या श्वसन मार्गाने उदरात नेले. ब्रह्मदेवांना गणेशाच्या देहात अनेक ब्रम्हांडे दिसली. त्यामुळे ब्रह्मदेव भांबावून गेले. गजाननाने स्वतःच्या अफाट शक्तीने एक ब्रम्हांड फोडून दाखवले. या ब्रम्हांडात ब्रह्मदेवास सर्व सृष्टीचे दर्शन झाले. त्या उदरातील ब्रम्हांडात पृथ्वी, मनुष्य, ऋषी, राक्षस, देव, स्वर्ग इत्यादि सर्वांचे दर्शन. झाले अशा प्रकारच्या अनेक सृष्ट्या विनायकाच्या उदरामध्ये ब्रह्मदेवांना बघावयास मिळाल्या. ब्रम्हांडाची रचना पाहून ब्रह्मदेव गोंधळून गेले. त्यांनी गणेशाला उदरातून बाहेर काढण्याची विनंती केली. ते म्हणाले, “ब्रह्मांडाचा अंत पाहणे माझ्या हातून शक्य नाही. माझे आठ डोळे सुद्धा ब्रह्मांड पाहण्यास अपुरे आहेत. खरोखर तू अनादि अनंत आहेस.” ब्रह्मदेवाची हि द्विधा स्थिती पाहून श्री गणपतीने त्यास आपल्या उदरातून बाहेर काढले.
आपल्याला साक्षात लंबोदर श्रीगणेशाचे दर्शन झाले व स्वतः गणेशाने आपणास वेद, शास्त्रे, पुराणे यांचे गुढ ज्ञान दिले, अशामुळे ब्रह्मदेवास गर्व झाला. त्यांना वाटले की माझ्यासारखा भाग्यवंत त्रैलोक्यात कोणीही नाही. आता आपण कोणालाही वाटेल तो वर किंवा शाप देऊ शकतो. सृष्टीची निर्मिती करणे सुद्धा अत्यंत सोपे आहे. असे समजून त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीस सुरुवात केली. पण दुर्दैवाने अनेक विघ्ने समोर येऊन उभी राहिली. हजारो विघ्ने ब्रह्मदेवाभोवती गोल गोल फिरू लागली. ब्रह्मदेवासमोर सर्व विघ्ने विचित्र हातवारे करत नाचू लागली. त्या सर्वांनी ब्रह्मदेवास उचलले व वर फेकले. खाली पडल्यानंतर एकाने ब्रह्मदेवाच्या चारही शेंड्या धरल्या व ओढायला सुरुवात केली. दुसऱ्या विघ्नाने ब्रह्मदेवाची दाढी उपटण्यास सुरुवात केली. पाच सहा विघ्नांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवास टपला मारण्यास सुरुवात केली. अशा रीतीने ब्रह्मदेवास त्या विघ्नांनी छळून काढले. काही वेळानंतर ब्रह्मदेवास श्री गणेशाचे स्मरण झाले.
आता श्री गणेश आपणास सोडवेल असे त्यांना वाटले. ब्रह्मदेव म्हणाले, “हे गजानना, तू विघ्नहर्ता आहेस. असे असताना सुद्धा मी सृष्टी निर्मिती करत असताना विघ्ने कशी काय उत्पन्न झाली ? हे विघ्ने मला छळून काढत आहेत. तू यांचा बंदोबस्त कर.” अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे प्रार्थना केली. त्यानंतर ब्रह्मदेव शांतपणे बसले होते. तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक स्वप्न पडले. स्वप्नात ब्रह्मदेवास एक मोठा वटवृक्ष दिसला. त्यांना वटवृक्षाच्या एका पानावर एक गोंडस निरागस बालक दिसले. त्या बालकाला चार करकमल होते, सर्वांगाला रक्तचंदनाची उटी होती. त्या बालकाच्या मस्तकावर रत्नांनी जडलेला मुकुट होता. गळ्यात सुवर्णमाला होत्या. कानात सुवर्ण कुंडले होती, त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते पण डोके मात्र हत्तीचे होते. त्याचा एक दात तुटलेला होता. त्या बालकाचे रूप मनोहर होते. बालकरुपी गजाननाने खाली उडी मारली व ब्रह्मदेवांकडे आले व त्यांना म्हणाले, “हे विधाता, सृष्टी निर्मिती करताना मी श्रेष्ठतम आहे असा तुला गर्व झाला. कोणतीही गोष्ट गर्वाने करू नये. तुझे गर्वहरण करण्यासाठी नानाविध विघ्नांनी तुला छळून काढले. आता मी तुझ्या मनातले ओळखले आहे. मी तुला सर्वात दिव्य असा एक अक्षरी मंत्र सांगतो. तू या मंत्राचा दहा लक्ष जप कर. त्यानंतर मी तुला सामर्थ्यवान बनवेन.”
ब्रह्मदेवांना जाग आली. तेव्हा ताबडतोब त्यांनी एकअक्षरी मंत्रउच्चारण द्वारा तपश्चर्येला प्रारंभ केला. ब्रह्मदेवाची ही घोर तपश्चर्या पाहून लंबोदर श्रीगणेशास आनंद झाला. गणेश ब्रह्मदेवास प्रसन्न झाला. गणेशाने ब्रह्मदेवास दिव्य दर्शन दिले. ब्रह्मदेवाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी गणेशास साष्टांग नमन केले व म्हणाले, “हे ओंकारस्वरूपा! तू अनाथांचा नाथ आहेस. तुझे हे दिव्य दर्शन भाग्यवंतांनाच लाभते. आज सोनियाचा दिवस आहे. तू माझ्यावर प्रसन्न झालास, त्यामुळे मी तुझ्याकडे वर मागतो. माझ्या हृदयकमलात तुझे सदैव स्मरण राहू दे. तुमच्या कृपेने मला सर्व सृष्टीची निर्मिती करता यावी. मी ज्या वेळी आपणास मार्गदर्शनासाठी बोलवेन तेव्हा आपण जरूर यावे.” श्री गणेश म्हणाला, “माझा मधुर प्रसाद सेवन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच माझ्या स्मरणाने तूमची सर्व विघ्ने नाहीशी होतील. मी सदैव तुमच्या वर कृपा वर्षाव करेन. आता तुम्ही वेळ न घालवता विश्वनिर्मितीच्या कामाला लागा.”
श्री गजाननाने ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे त्याला सृष्टी रचना करण्याचे दिव्य सामर्थ्य दिले. पूजा झाल्यानंतर तेथे दोन लावण्यवती कन्या निर्माण झाल्या. या दोन देवि लावण्यवती कन्या म्हणजेच सिद्धी व बुद्धी होय. ब्रह्मदेवाने या विश्वातील प्रत्येकाचे कल्याण होवो असा वर मागितला. सिद्धी व बुद्धीस श्री गणेशाकडे सुपूर्त केले. श्री गणेशाने त्या दोन कन्यांचा स्वीकार केला.
ब्रह्मदेवाने सर्वप्रथम गजाननाचे पुन्हा एकदा स्मरण केले. आपले बाहू, मांड्या व चरणकमल यांपासून क्षत्रिय वगैरे तीन वर्णांची उत्पत्ती केली. नाभिककमला पासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, चरणकमला पासून पृथ्वी अशा पद्धतीने चातुर्य पूर्वक ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने अनेक वस्तू निर्माण केल्या. या वस्तूंची निर्मिती केल्यामुळे मनुष्याला फायदाच झाला. यामध्ये ब्रह्मदेवाने सागर, पर्वत, सरिता, वृक्ष, वेली, गवत इत्यादी अनेक वस्तू निर्माण केल्या.
[25/08, 12:11 pm] +91 83290 19361: *श्री गणेश पुराण कथा (ब)*
*सिद्धीविनायकाची महिमा, मधु व कैटभ दैत्यांचा वध*
काही काळानंतर एक आश्चर्य घडले. सृष्टी निर्मिती करते वेळी लक्ष्मीपती श्रीविष्णू निद्रावस्थेत होते. त्यांच्या कर्णातून दोन अक्राळविक्राळ राक्षस आले. हे दोन राक्षस म्हणजे मधु व कैटभ होय. त्या राक्षसांनी सृष्टीचा निर्माण कर्ता ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक ऋषी मुनींच्या आश्रमांवर हल्ले केले. आश्रमांची नासधूस केली. त्या दोघांनी त्रैलोक्यात सर्वत्र हाहाकार माजवला. त्या दोघांनी नंतर स्वर्गावर आक्रमण केले. ते दोघेही महापापी होते. त्यामुळे ते वेद,शास्त्र, पुराने यांची निंदा करताना घाबरत नसत. त्या दोघांनी ब्रह्मदेवावर हल्ला केला. त्यांना गिळून टाकण्यासाठी कैटभाने आपले विशाल तोंड उघडले. ब्रह्माने प्रसंगावधान राखून निद्रादेवीची स्तुती केली.
या निद्रादेवीने विश्वाचा पालनकर्ता विष्णूस मोहित केले होते. त्यामुळे विष्णू निद्रावस्थेत गेले होते. ब्रह्मदेव म्हणाले, “हे देवी, तुझी लीला अगाध आहे. तू साक्षात विष्णूस मोहित केलेस. आता विष्णु जागे करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यांना तू जागे केले नाहीस तर सर्व अनर्थ होईल. त्यामुळे तू लवकरात लवकर विष्णूलोकी जा व केशवास जागे कर.” देवाधिदेव विष्णू जागे होईपर्यंत या राक्षसांनी अत्यंत गोंधळ केला होता.
त्यानंतर केशवाला जाग आली. त्या दोघांनी विष्णूस युद्धासाठी आव्हान दिले. विष्णूने ते आव्हान स्वीकारून घनघोर युद्ध केले. दोघांबरोबर विष्णूने मल्लयुद्ध सुरू केले. हे मल्लयुद्ध पाहण्यासाठी आकाशात देव-देवतांची गर्दी झाली. दोघे दैत्य व विष्णू आपली पूर्ण शक्ती पणास लावत होते. काही वेळा त्यांनी विष्णूंना खाली पाडले तर काही वेळा विष्णूने त्यांना गरगर फिरवून जमिनीवर आपटले. पण विष्णू राक्षसांचा पराभव करु शकले नाही. त्यामुळे विष्णु उदास झाले. त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी गायनामध्ये निपुण असलेल्या गंधर्वाचे रूप घेतले व हाती वीणा घेऊन दरबारी, कानडा, मालकंस, यमन, कल्याण इत्यादीसारख्या अनेक रागांचे गायन केले.
अशा प्रकारे त्यांचे स्वर्गीय आनंद देणारे गाणे ऐकून देव ,गंधर्व आनंदित झाले. शंभू महादेवांना सुद्धा हे दिव्य गायन ऐकून आनंद झाला. नारायणाने कैलासावर शंकराचे दिव्य दर्शन घेतले. भोलेनाथ व्याघ्र चर्मावर बसले होते. शेजारी त्रिशुल होते, तेथेच डमरू सुद्धा होता. गळ्यात साप होता. सर्वांगाला भस्म फासले होते. विष्णूने महादेवास नमन केले. विष्णू म्हणाले, “हे शिवशंभो, आज तुमचे दिव्य दर्शन झाल्यामुळे परमानंद झाला. सतत ॐ नमः शिवाय चा जप करणारे शिवभक्त तुमच्या चरणी लीन होतात. तुम्हाला कोटीकोटी प्रणाम.” विष्णूंचे गाणे ऐकून त्यांचे सुपुत्र श्रीगणेश, प्रियतमा पार्वती, नंदीला वगैरे आनंद झाला. विष्णू म्हणाले, “हे त्रिनेत्रधारी शिवशंभो, सर्व त्रैलोक्यात मधु व कैटभ यांनी गोंधळ माजवला आहे. या दुष्टांचा बंदोबस्त कसा करावा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर उभा आहे.” भोलेनाथ म्हणाले, “हे विष्णु, तुम्ही युद्ध करण्यापूर्वी माझ्या सुपुत्राचे म्हणजेच गणेशाचे स्मरण केले नाही. त्यामुळे तुम्हाला अपयश आले. आता दुसरे युद्ध करण्यापूर्वी गणेशाचे पूजन करूनच युद्धास सुरुवात करा.गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करा.”
भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे श्रीविष्णू तपश्चर्येसाठी गेले. श्रीविष्णूंनी सिद्धिक्षेत्र तपश्चर्येसाठी निवडले. त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्या पावन क्षेत्रात नारायणाने षडाक्षरी मंत्राचा शास्त्रशुद्ध जप केला. त्यानंतर लंबोदर श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले व म्हणाले, “हे लक्ष्मीपती, तुमच्या तपश्चर्येमुळे मी संतुष्ट झालो आहे. तुम्ही शंभर वर्ष तप केले, त्यामुळे तुम्ही धन्य आहात. तुम्हाला हवा तो वर मागून घ्या.” त्यावर विष्णू म्हणाले, “आपण शिवपार्वतीचे सुपुत्र आहात. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे. मला मधु व कैटभ या दोन दैत्यांना ठार मारायचे आहे. त्यासाठी मला शक्ती व युक्ती द्या. तसेच आणखी कोणी राक्षस उत्पन्न झाल्यास त्यांना ठार मारताय यावे म्हणून दिव्यास्त्र प्रदान करा.”
गणेशांनी त्यांची मनोकामना पूर्ण केली. जिथे विष्णूंना वर मिळाला त्याच ठिकाणी विष्णूंनी एक मोठे मंदिर बांधले. त्या मंदिरातल्या भिंतींवर श्रीगणपती अथर्वशीर्ष, गणपतीस्तोत्र कोरून घेतले. त्या ठिकाणी गंडकी शिळेची सुंदर मूर्तीची स्थापना केली. त्या ठिकाणी नारायणास सिद्धी प्राप्त झाली, म्हणून त्या मूर्तीस सिद्धिविनायक असे नाव दिले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन विष्णू मधु व कैटभ या दोन दैत्यांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाले. त्या तिघांमध्ये घनघोर युद्ध झाले.
बराच काळ युद्ध सुरू होते. श्री विष्णू दैत्यांना म्हणाले, “तुम्ही दोघेही शूरवीर आहात. आज पर्यंत मी तुमच्यासारखे योध्ये पाहिले नाहीत. मी तुमच्यावर प्रसन्न आहे, त्यामुळे तुम्ही मागाल तो वर देण्यास मी तयार आहे. ही सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही.” जगदीश्वराच्या या बोलण्यावर ते दैत्य मोठ्याने हसू लागले. ते विष्णूस म्हणाले, “अरे तुझ्या पेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. तुलाच एखादा वर हवा असेल तर मागुन घे. आम्ही वर देण्यास तयार आहोत.” विष्णूंनी क्षणभर विचार केला व म्हणाले, “आपला मान राखण्यासाठी मी एक वर मागतो तो मला आपण द्यावा. तुम्ही दोघांनी माझ्या हस्ते यमलोकी जावे, असा मला वर हवा आहे.” विष्णूंच्या चातुर्यपूर्वक उत्तरामुळे मधु व कैटभ दैत्य विष्णूला शरण गेले व म्हणाले, “आपली योग्यता श्रेष्ठतम आहे. त्यामुळे हे देवाधिदेव नारायणा, तूच आमचा वध कर. त्यामुळे आम्हाला मोक्ष मिळेल.” त्या नंतर त्या दोघांनी नारायणाला साष्टांग नमस्कार केला. त्या दोन्ही दैत्यांच्या इच्छेनुसार आपल्याजवळील सुदर्शनचक्राने विष्णूनी दोघांचा वध केला. मधु व कैटभ दैत्यांचा नाश केल्याने विष्णू मधुसूदन या नूतन नावाने ओळखले जाऊ लागले. विष्णुसहस्त्रनामावली मध्ये मधुसूदन या नावाचा उल्लेख आढळतो.
[25/08, 12:12 pm] +91 83290 19361: *श्रीगणेश*
भाग - ३.
धनुर्विद्या आणि एकवीस कोटी गायत्रीमंत्राचा जप विनायकाने पुर्ण केला. शिक्षण आणि तपश्चर्या पुर्ण झाल्यावर आपल्या सहकार्यांसह शंकराचा निरोप घेऊ लागला तेव्हा शंकर-पार्वतीला गहिवरुन आले. वियोग सहन होत नव्हता, पण प्रजाहितासाठी नरांतकाचा नाश करणे अनिवार्य होते. भूतान राज्यातील लोक गणपतीला पार्वती-शंकराचा मुलगाच मानत. तीच प्रथा आर्यवर्तात रुजु झाली.... दंतकथा अशीही आहे की, एकदा पार्वती स्नानाकरितां गेली असतांना गणपतीला दारावर पहार्यासाठी उभे राहायला सांगुन कुणालाही आंत येण्यास मज्जाव करावा अशी आज्ञा दिली.
पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे विनायक दारावर पहार्याकरिता ऊभा असतांना शंकर तिथे येऊन आंत जाऊ लागले म्हणून गणपतीने त्यांना विरोध केला असतां संतापाच्या भरात शंकराने त्याचे शीर धडावेगळे केले. पार्वतीला कळल्यावर तिला शोक अनावर झाला. गणपतीला जिवंत करण्यासाठी ती शंकराला विणवू लागली. तेव्हा शंकराने हत्तीचे मस्तक आणुन त्याच्या धडावर ठेवल्याबरोबर तो जिवंत झाला.
चोवीस वर्षाचा तरुण विनायक श्रीशंकराचा आशिर्वाद घेऊन प्रत्येक राज्यातील गुरुकुलात जाऊन तिथल्या विद्वान पंडीतांशी वादविवाद करुन विजयपत्र घेऊ लागला. त्याच्या २१०० मित्रांनी राज्यातील गावोगावी जाऊन सुर्योपासनेचा प्रचार करुन शिस्तबध्द गणसैन्य तयार होऊ लागले.
नरांतकाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अनाथांच्या आर्त किंकाळ्या ऐकुन त्यांना धीर देत अश्रू पुसू लागला. गणसैन्याचं संचालन सुरु होऊन असुरी सैन्यांना प्रतिकार होऊ लागला. नरांतकाच्या हेरांचा प्रमुख धुम्राक्षाने बातमी दिली की, "कश्यपपुत्र विनायकाने २१ - २१ च्या गटाने त्रिशूल घेऊन गजध्वजाखाली जमतात. सुर्योपासना व गायत्रीमंत्र हा त्यांचा धर्म असुन देव, देश आणि धर्म यांच्या संरक्षणासाठी हे लोक आपल्या हुकुमाचा व सैन्याचा प्रतिकार करीत आहेत, शिवाय आर्य स्रीयांही या चळवळीत भाग घेत आहेत. आपण ज्या २१ हजार तरुणींना सिंधुपुरातील कारागृहात बंदिस्त केल्यात, त्यांच्या सुटकेसाठी रिध्दी-सिध्दी प्रयतनशील आहेत. महागणपतीच्या नेतृत्वाखाली मोठे स्रीसैन्य तयार होत आहे.
धुम्राक्षाने दिलेली माहिती ऐकुन क्रुर नरांतकाचा संताप अनावर होऊन त्याने जनतेवर, स्रीयांवर अत्याचाराचा कळस गाठला. एकदा कांबोज नगरीतील कांबोजिया नदीत रिध्दी सिध्दी गायत्रीमंत्रांचा जप करीत असतां विनायक त्यांना भेटला. सिंधपुरातील बंदिवासात असलेल्या एकविस हजार तरुणींंना सोडवण्यासाठी मार्गदर्शन मागीतले असतां, महागणपतीने २१-२१ च्या गटाने स्रीसैन्याची आखणी करुन आठ विभाग करायला सांगीतले. शक्ती, भक्ती आणि तेजाचे हे कार्य केल्यास भारतखंडाच्या ऊत्कर्षास साह्य होईल, कामाची वाटणी कशी करायची हे मार्गदर्शन करुन तो घरी आला असतां, व्यासांनी त्याला बद्रीकाश्रमी बोलावल्याचा निरोप मिळाला, त्याचवेळी रत्नापुरच्या काशीराजांकडून त्यांच्या मुलाच्या राजपुत्राच्या लग्नाचे पौरुहित्य करण्यासाठी निमंत्रण आले.
विनायकाची द्विधा मनःस्थिती झाली, प्रथम व्यासभेट घेण्यासाठी बद्रीकाश्रमाकडे निघाला. महागणपती ज्या रस्त्याने जाणार त्या जंगलांत नरांतकाचे सैन्य विनायकाला ठार करण्यासाठी दडुन, लपुन बसले. विनायक त्यांच्या कक्षेत आल्याबरोबर एक पिसाळलेला हत्ती त्याच्यावर सोडला. सावध विनायकानं हत्तीवर पाश फेकुन त्याची सोंड व पुढील पाय आवळुन त्याच्या गंडस्थळावर त्रिशुल खुपसुन ठार केले. एवढा मदोन्मत हत्ती कोसळलेला पाहुन राक्षससैन्य पळुन गेले.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
[25/08, 12:13 pm] +91 83290 19361: *श्रीगणेश*
भाग- ४.
विनायक बद्रिकाश्रमात पोहोचल्यावर व्यासांना वंदन करुन बोलावल्याचे कारण विचारले असता ते सद्गतीत कंठाने म्हणाले, "विनायका, तू कवींचा कवी, बुध्दिवंताचा बुध्दिदाता आहेस. तुला मौजीबंधनाच्यावेळी पहिलं पर्व अर्पण केले होते. नंतर अठरा पर्वाचा अाराखडा पुर्ण केला, तरी तू महाभारत लिहावेस." त्याची आज्ञा शिरसावंद्य मानुन गणेशाने, सरस्वती तर त्याच्यावर लुब्ध होतीच, तीच्या प्रेरणेने महाभारत लिहिण्याचे कार्य व्यास कुटीत बसुन पुर्ण केले. व्यासांचा निरोप घेतांना व्यास आशिर्वाद देतांना त्याला म्हणाले, "हे सूर्योपसका! या थोर भारतात तुझ्या आज्ञा वेदाप्रमाणे मानल्या जाऊन सर्वत्र विजयी होशील."
बद्रीकाश्रमातुन निघतांना महागणपतीने २१०० महाभारताच्या प्रती संबंध आर्यवर्तात पाठविल्यात. घरोघरी महाभारताचं वाचन, पठन, मनन सुरु झालं. त्याचं नांव अबालवृध्दांच्या जीभेवर खेळु लागलं." श्री गणेशाय नमः।" असा मंत्र आबालवृधांच्या जीभेवर खेळु लागलं. प्रत्येक ठिकाणी गणेशाचं पुजन सुरु झालं. महागणपती आपल्या २१०० गणांसह सिंधूपुरास वळसा घालुन महापर्वत ज्वालामुखी ओलांडुन पाताळात रत्नापुरच्या काशीराजांच्या मुलाच्या लग्नास निघाला असतां वाटेत पुनः एक विघ्न आले.
वाटेतल्या भयंकर अरण्यात नरांतकाच्या सैन्याने गणपती व त्याच्या गणांवर जोरदार हल्ला चढविला. दोन्हीकडच्या सैन्यामधे भयंकर युध्द सुरु झाले. शेवटी दुर्वासांनी दिलेल्या शक्तीचा उपयोग करुन एक तेजस्वी बाण जो शंकरांनी दिला होता, सुवर्णभूषित, धुम्रयुक्त आणि भूजंगाप्रमाणे तिक्ष्ण बाण सूर्याला वंदन करुन पाशुपत धनुष्यास जोडुन नरांतकाच्या वक्षस्थळावर सोडल्याबरोबर नरांतक भूमीवर कोसळला. गणेशाने सिंधूपुरांत बंदिस्त असलेल्या एकवीस हजार कुमारिका बंधनमूक्त केल्यात. त्याच्या सन्मानार्थ अनेक वैभवसंपन्न राजांकडुन भोजनाचे निमंत्रणे आलीत, एका गरीब त्रृषीने तर गुळखोबर्याचे एकवीस मोदक करुन खाऊ घातले. विनायकाला खुप आवडले. तेव्हापासुन गणपतीला एकवीस मोदकांचा नैवद्य दाखवणे सुरु झाले.
भाद्रपद शुध्द चतुर्दशीला श्रीमहागणपती आपल्या अनुयायानासह रत्नपुरीहून उत्तरेस निघाला. जनतेने गणेशाच स्मारक म्हणुन हत्तीचा मुखवटा घातलेली भव्य मूर्ती तयार करुन भक्तीभावाने मंदिरात स्थापना केली. दहा दिवस उत्सव केला. नंतर विनायक हिमालयाकडे निघालाक प्रत्येक ठिकाणी जनतेने भव्य स्वागत सत्कार करुन उत्सव केलेत. गणेश पित्याच्या.. कश्यपांच्या आश्रमात येऊन माता पित्यांस वंदन केले.
विश्ववंद्य झालेल्या आपल्या पुत्राने तिन्ही लोकांत किर्तीचा झेंडा रोवलेला पाहुन माता अदितीस खुप धन्यता वाटली. अदिती विनायकास म्हणाली, तुझे ब्रम्हाश्चर्यव्रत संपला. ब्रम्हदेवाची मुलगी कुमारी सरस्वती-शारबा तुझ्यासाठी निवडली. तू महाभारताची रचना केलेली पाहुन ती तुझ्यावर अनुरक्त, लुब्ध झाली. तिच्याशी तू लग्न करावेस. नम्रतेने गणेश आईला म्हणाला, माते! क्षमा कर. मला संसारात पडायची इच्छा नाही. भारताची सेवा करण्यातच मला आयुष्य घालवायचे आहे.
अधर्मिय दुष्टांकडुन अत्याचार होतील त्यावेळी देव, देश, धर्म आणि आर्यस्रीधनाचं रक्षण व्हावं ह्या कार्याचे जनतेस स्मरण व्हावं, म्हणुन दरवर्षी दहा दिवस साजरे व्हावेत, या कार्याचा संपुर्ण विश्वात प्रसार करण्याचे ठरविले. आताही गणेश चतुर्थीपासुन अनंतचतुर्दशीपर्यत गणेशोत्सव आपण दरवर्षी
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
श्री गणेश पुराण कथा (क)*
*भीमराजाची कथा*
महान तपस्वी व्यासांना ब्रह्मदेवांनी गणेश महात्म्य संबंधी आणखी एक रसाळ कथा सांगण्यास प्रारंभ केला.
भीम राजा विदर्भ देशातील कौण्डिन्य नगरात राहात होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती, सत्ता,ऐश्वर्य होते. भीम राजा मोठा पराक्रमी व दानशूर होता. प्रजादक्ष होता. अशा भीम राजास एक सात्विक, पतिव्रता प्रियतमा होती. तिचे नाव होते चारुहासिनी. तिला कशाचीही कमतरता नव्हती. पण मूलबाळ नसल्याने ती दुःखी असे. आपल्या अर्धांगिनीला झालेले दुःख राजास सहन होत नसे. एके दिवशी राजा आणि राणी एकांतात बसले होते. भीम राजा म्हणाला, “हे प्रिये, आपल्या विवाहास खूप वर्ष झाली. पण अजून सुद्धा पुत्रसंतती झाली नाही. त्यामुळे आपण राज्यत्याग करून, देवाची तपश्चर्या करण्यासाठी घनदाट अरण्यात जाऊ. त्यातच आपले हित आहे.”
त्यानंतर भीम राजांनी दोन विश्वासू प्रधानांना बोलवले. त्या दोन प्रधानांची नावे मनोरंजन व सुमंत अशी होती. त्यांना भीम राजा म्हणाला, “आम्ही दुःखी होऊन ह्या राज्याचा त्याग करुन वनात तपश्चर्या करण्यासाठी जात आहोत. तेथून आमचे पुन्हा येथे आगमन झाले नाही तर दोघांमध्ये अर्धे अर्धे राज्य वाटून घ्या व सुव्यवस्थित राज्यकारभार चालवा. प्रजेची काळजी घ्या.” नंतर भीम राजाने सपत्नीक अरण्याकडे प्रस्थान केले. ते दोघेही घनदाट अरण्यात आले. त्यांना तेथे एक निसर्गरम्य आश्रम दिसला. तो आश्रम महान तपस्वी विश्वामित्र ऋषींचा होता. तेथे विश्वमित्र दर्भासनावर शांतपणे बसले होते. ते दोघेही त्या आश्रमात गेले. आश्रमात आल्यानंतर भीम राजा व राणीने त्यांना वंदन केले. आपल्या दिव्य ज्ञानाने राजाचे आगमन येथे कशासाठी झाले आहे हे त्यांनी ओळखले.
विश्वमित्र ऋषी म्हणाले, “तुला सर्व सुखांची प्राप्त होईल, तुझ्या पोटी सद्गुणी, सात्विक, कीर्तीमान पुत्र जन्म घेईल. तू शिवपार्वती सुताचे म्हणजेच श्री गणेशाचे पूजन करण्यास सुरुवात कर. त्या गणेशास सर्व गोष्टीचे ज्ञान आहे. तुझे कुलदैवत मंगलमूर्ती श्री गणेश असताना सुद्धा संपत्तीच्या अहंकारामुळे तू त्याचे पूजन केले नाहीस. तेहतीसकोटी देवदेवतांमध्ये गणेशास अग्रपूजेचा मान मिळाला आहे. त्याचे स्मरण न केल्यामुळे सर्व देवदेवता तुझ्यावर असंतुष्ट आहेत. त्यामुळे तू निपुत्रिक आहेस. गजाननाच्या कृपेमुळे तुला नक्कीच संतान प्राप्ती होईल. तो आपल्या भक्तांची कामना पूर्ण करतो. आता तुला तुझ्या पूर्वजांचे चरित्र सांगतो, ते नीट ऐक.”
तुझ्या सातव्या पूर्वजांचे नाव होते भीम. तो सुद्धा पराक्रमी राजा होता. त्याच्या अर्धांगिनीचे नाव होते कमला. या दांपत्यास अनेक वर्षानंतर संतानप्राप्ती झाली. तो मुलगा जन्मताच मुका व बहिरा होता. त्याच्या पाठीला कुबड होते. सर्वांगाला क्षते पडली होती. सर्वांगाला दुर्गंधी येत होती. यामुळे महाराणीस रडू कोसळले. आता आपणच मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे राजास वाटले. राजाने काही विद्वान ज्योतिषांना या राजपुत्राचे नाव काय ठेवू असा प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, “राजन राजपुत्रास जन्मताच व्यंग आहे. त्याची जन्मभर दक्षता घ्यावी लागेल. त्यामुळे तू त्यांचे नाव दक्ष असे ठेव.” नामकरण समारंभानंतर आपल्या पुत्रासाठी राजाने अनेक मंत्र, तंत्र, देशी-विदेशी औषधे उपाय करून पाहिला. पण सर्व परिश्रम वाया गेले. त्यामुळे राजाने एक तप तपश्चर्या केली. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.
राजाच्या मनावरचा संयम गेला. तो चिडक्या स्वभावाचा झाला. एक दिवस रागाच्या भरात आपल्या प्रियतमेस म्हणाला, “तू व तुझा मुलगा येथून ताबडतोब जा. मला तुम्हा माय लेकाचे तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही.” असे बोलून राजाने त्या दोघांना घरातून हाकलून दिले. आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन कमला राणी गावोगावी फिरून भिक्षा मागून पोट भरत असे. ती भिक्षा मागण्यासाठी जाताना मुलाला मंदिरातच ठेवत असे. एकदा अशीच ती भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेली असता, तेथे एक महान भगवद् भक्त आला. तो ब्राह्मण होता. त्याच्या नजरेस ते मूल दिसले. त्याची दया येऊन ब्राह्मणाने ते उचलेले. ब्राह्मणाच्या शरीरावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने त्या व्यंग मुलाचे सर्वांग व्यवस्थित झाले. तो सामान्य मुला सारखा दिसू लागला. कुरूप मुलाचे गोंडस, मनमोहक मुलामध्ये रूपांतर झाले. त्याच्या अंगावरील सर्व क्षते नाहीशी झाली.
कमला राणी भिक्षा मागून परत आल्यानंतर तिला फार आनंद झाला. हे आपले मुल सुंदर कसे काय झाले ते तिला कळेना. तिने देवाचे आभार मानले. त्यानंतर काही वर्षानंतर देवास आपण प्रसन्न करून घ्यावे असे राजपुत्रास वाटले. दक्ष मनात म्हणाला, ‘तेहतीस कोटी देव देवता असून सुद्धा, श्री गणेशास अग्रपूजेचा मान आहे. तेव्हा मंगलमूर्तीलाच आपण प्रसन्न करून घेऊ या. तोच आपली मनोकामना पूर्ण करेल.’ दक्षाने श्रीगणेश उपासनेस प्रारंभ केला. प्रथम ॐ गं गणपतये नमः असा अष्टाक्षरी मंत्र जपण्यास सुरुवात केली. श्री गणेश त्याला प्रसन्न झाले. तेव्हा दक्षास गणपतीचे मनोहर रूप दिसले. एका क्षणातच गणपतीने ब्राह्मणाचे रूप घेतले व म्हणाले, “मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी या लहान वयात बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे.”
यावर राजपुत्र दक्ष म्हणाला, “हे शिवपार्वती सुता, गजानना, आता साक्षात तुझे दर्शन झाल्यामुळे मी आनंदी आहे. मी आता तुमच्याकडे वर मागतो.” त्यामुळे गजाननाने आपले पूर्वरूप धारण केले व म्हणाले, “बाळा, मी तुला वर देत नाही. कारण तो अधिकार माझा लाडका भक्त मुद्गल याचा आहे. त्याच्याच दिव्यस्पर्शामुळे तुझे शरीर सर्वांगसुंदर झाले. तू त्याच्या आश्रमात जाऊन भेट घे. तो नक्कीच तुला वर देईल.” असे सांगितल्यावर गणपती अंतर्धान पावले. हे पाहून दक्षाला रडू कोसळले. गजानन अंतर्धान पावल्यानंतर सर्वकाही त्याग करून दक्ष श्रीगणेशाच्या शोधासाठी बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याची माता पण होती. अशाप्रकारे भटकंती करत सुदैवाने राजकुमार दक्ष मुद्गल ऋषीच्या आश्रमात गेला.
भक्तिमय वातावरण पाहून दक्षास परमानंद झाला. आश्रमात व्याघ्र आसनावर मुद्गल ऋषी बसले होते. त्यांच्या समोर श्रीगणेशाची एक मनमोहक मूर्ती होती. ते भक्तीयुक्त अंतःकरणाने श्रीगणेशाची पूजा करत होते. दक्षाने त्यांना नमन केले. दक्ष म्हणाला, “मुनीवर, आपले उपकार मी कधीही विसरणार नाही. तुमच्या मुळेच माझे कुरूप शरीर सुंदर झाले. श्री गजाननाने मला दोन रूपाचे दर्शन घडविले. त्यांनी मला सांगितले की आपण मला वरदान द्याल , म्हणून मी येथे आलो आहे.” राजपुत्राचे हे बोलणे ऐकल्यानंतर मुद्गल ऋषी म्हणाले, “दक्ष, तु खरोखर भाग्यवान आहेस. साक्षात श्री गजाननाने तुला द्वी रूप दाखवले. म्हणजे भक्तीत तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मी गेल्या हजार वर्षापासून गणपतीच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत आहे, तरीसुद्धा तो माझ्यावर असंतुष्ट आहे.” असे बोलून मुद्गल ऋषिंनी दक्षास मिठी मारली.
त्यांनी राजपुत्रास एका दिव्य मंत्राचा उपदेश केला. तो दिव्य मंत्र म्हणजे एकाक्षर मंत्र होय. ऋषी म्हणाले, “तू नित्यनेमाने, भक्तिमय अंतकरणाने या एकाक्षर मंत्राचा निष्ठापूर्वक जप करत जा. यामुळे श्री विनायक तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.”
[26/08, 11:47 am] +91 83290 19361: *श्री गणेश पुराण कथा (ड)*
*बल्लाळ विनायकाची कथा*
सोमकांत राजाने आदरणीय भृगु ऋषींना प्रश्न विचारला, “ऋषी महाराज, स्वतः मुद्गल ऋषी एवढे तपस्वी असून सुद्धा त्यांच्यावर गजानन प्रसन्न का झाला नाही? दक्षाने ऋषीएवढी तपश्चर्या केली नव्हती तरी त्याला गजानन प्रसन्न कसा झाला? भृगु ऋषी म्हणाले, “मी तुला दक्ष राजपुत्राची पूर्वजन्माची सर्व हकीकत सांगतो.”
सिंधू नावाचा एक देश होता. त्या देशात एक गाव होते. त्या गावाचे नाव होते पल्ली. या गावात फार वर्षापूर्वी एक वाणी राहत होता. त्याचे मोठे किराणा मालाचे दुकान होते. या वाण्याचे नाव होते कल्याण. तो नावाप्रमाणेच दुसऱ्याचे कल्याण करीत असे. तो रोज लक्ष्मीची पूजा करत असे. त्याला सात्विक पत्नी लाभली होती, तिचे नाव होते इंदुमती. अशा या दांपत्यास देवाच्या कृपेमुळे सुपुत्र लाभला. त्यांनी त्याचे नाव ठेवले बल्लाळ. बल्लाळला लहानपणापासून खेळण्यात मुळीच रस नव्हता. त्याला देवपूजा करण्यास फार आवडत असे. एके दिवशी बल्लाळाच्या मनात वेगळाच बेत होता. त्याने एक गोटा घेतला व त्याला गणपती असे सर्वांच्या साक्षीने नाव दिले. त्याला फुलांचा हार घातला व दुर्वाची जुडी वाहिली. नंतर सर्व बालसेनेने मिळून श्रीगणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली.
बल्लाळाच्या काही मित्रांच्या जन्मदात्यांना हा प्रकार आवडला नाही. ते बल्लाळाच्या वडिलांना त्याबद्दल बोलले. गावातल्या लोकांचे हे बोलणे ऐकल्यावर कल्याण अत्यंत संतापला. वेताची काठी घेऊन तो गावाबाहेर गेला. कल्याणाने कसलाही विचार न करता काटक्यांचे देऊळ, मंडप वगैरे सर्व काही दूरवर फेकून दिले. बल्लाळ तिथे शांत चित्ताने नेत्रकमले बंद करून श्री गजाननाचे ध्यान करीत होता. कल्याणने त्याला पकडले व छडीने त्याला यथेच्छ बडवून काढले. त्यानंतर एका झाडाला उलटे लटकावून ठेवले.हा सर्व प्रकार झाल्यानंतर कल्याण घरी निघून गेला. त्याने इंदुमतीला सर्व हकिकत सांगितली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
इकडे बल्लाळने श्रीगणेशाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. “समुद्रमंथनाच्या वेळी हालाहल विष शंकराने प्राशन केले त्या नीलकंठाचा व पतिव्रता पार्वतीचा तुम्ही सुपुत्र आहात. तुम्हाला प्रथम कोटी कोटी प्रणाम. आता माझ्यावर जे संकट आले आहे, त्याचे तुम्हीच निवारण करा. मी तुमच्या दिव्य दर्शनासाठी आतुर झालो आहे.” आपल्या पिताश्रींनी श्रीगजाननाचे देऊळ मोडून टाकले, हे लक्षात आल्यानंतर बल्लाळ रागावला व त्याने साक्षात् जन्मदात्याला शाप दिला, ‘माझ्या जीवाचे जीवन असणारे श्री गजाननाचे मंदिर ज्याने फेकून दिले, तो दृष्टिहीन होईल, तसेच बहिरा, मुका व कुबडा होईल. त्याच्या शरीरास दुर्धर रोग होऊन सर्वांगास दुर्गंध सुटेल. हे देवा श्रीगणेशा मी जर तुझी भक्तीमय अंतकरणाने पूजा केली असेल तर हा शाप खरा होऊ द्या.’
बल्लाळाच्या भक्तीवर श्रीगजानन प्रसन्न झाले. त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात बल्लाळास दर्शन दिले. श्रीगणेशाने बल्लाळला बंधनातून मुक्त केले. बल्लाळाने श्रीगणेशाला साष्टांग नमस्कार घातला व गणपती स्तोत्राच्या पठणास प्रारंभ केला. श्री गणेशाच्या कृपादृष्टीने बल्लाळाच्या सर्व जखमा बऱ्या झाल्या. त्याचे शरीर पूर्ववत झाले. लंबोदराने त्याला जवळ बोलावले व म्हणाले, “एवढ्याशा वयात तुझी गणेश भक्ती पाहून मी धन्य झालो. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तू दिलेला शाप खरा होईल. पुढील जन्मात त्याला त्याचे वडील घराबाहेर हाकलून देतील.”
बल्लाळ म्हणाला, “तुमचे दिव्य रूप माझ्या हृदयात राहू द्या व मुखामध्ये सदैव तुमचे नामस्मरण असू द्या. तुम्ही आता इथेच राहून लोकांवर प्रेमाचा वर्षाव करा. त्यांच्या प्रापंचिक अडचणी दूर करा.” गणपती म्हणाले, “जशी तुझी इच्छा! तू मला इथे राहण्यासाठी सस्नेह आमंत्रण दिले, त्यामुळे माझ्या आधी लोक तुझे नाव घेतील. मी बल्लाळविनायक या नामरूपाने प्रसिद्ध होईल. अनेक गणेशभक्त माझ्या दर्शनासाठी येतील.”
बल्लाळाने दिलेला शाप खरा झाला. त्या कल्याण वाण्याचे सर्व अंग बधीर झाले. त्याची वाचा गेली. तो दृष्टिहीन झाला. त्याला काही ऐकू येईना. त्याच्या शरीरात दुर्धर रोग झाला. इंदुमती ने मात्र त्यांची साथ सोडली नाही. इंदुमती आपल्या मैत्रिणींसह बल्लाळाला आणण्यासाठी गावाबाहेर आणण्यात गेली. तेथे गेली तर तिला वेगळेच दिसले. तिथे एक श्री गजाननाचे सुंदर मंदिर होते. बल्लाळ श्रीगणेशाची पूजा करत बसला होता. तिने धावत जाऊन आपल्या सोनुल्यास मिठी मारली व म्हणाली, “आता तू घरी चल. तुझे वडील फार आजारी आहेत. तू दिलेल्या शापामुळे हे सर्व झाले आहे. त्यामुळे तूच आता पिताश्री साठी काहीतरी उपाय शोधून काढ.” बल्लाळ म्हणाला, “पिताश्रींच्या हातून महापाप झाले. त्यामुळेच मी त्यांना शाप दिला. मला आता सर्व गोष्टींचे ज्ञान झाले आहे. त्यामुळे मी घरी येणार नाही. माझे जीवन श्रीगजाननाच्या चरणी अर्पण करणार आहे. त्यामुळे तू आता घरी जाऊन पती परमेश्वराची सेवा कर. तू सुद्धा गजाननाची भक्ती कर.”
इंदुमती म्हणाली, “याच्यासाठीच आम्ही तुला जन्म दिला का? तू शाप देताना थोडा तरी विचार करायला हवा होतास. आपल्या पिताश्रींना शाप दिल्यामुळे तुझे पुण्य नक्कीच क्षीण झाले आहे. वृद्धापकाळी आधार असावा म्हणून आई-वडील मुलांना जन्म देतात. पिताश्रीमुळे तुला हे निसर्गरम्य जग पाहायला मिळाले. तेव्हा त्यांच्या उपकारांची परतफेड कर. बल्लाळ म्हणाला, “मला क्षमा कर माते. मी चुकलो. मी तेथे येऊन सुद्धा उपयोग नाही. पुढील जन्मी त्यांचे कल्याण होईल. त्यांना राजकुळात जन्म मिळेल. त्यावेळी तुझे नाव कमला असेल. तुम्हाला भविष्यकाळात श्री गजाननाचे दर्शन नक्की होईल. त्याची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील.” ती भविष्यवाणी ऐकून इंदूमती घरी आली. बल्लाळाला आणण्यासाठी श्रीगणेशाने खास दिव्य विमान पाठवले. त्या विमानात बसून बल्लाळाने स्वर्गलोकी प्रस्थान केले.
भाग -५.
सर्व शास्रांमधे श्रीगणेशाला सर्व देवांपेक्षा महत्वाचं स्थान आहे. श्रीगजाननाची अाराधना म्हणजेच सर्व देवांची आराधना केल्याचं फळ मिळते, कारण ब्रम्हा, विष्णु, महेश तीन मुख्य देव! पैकी ब्रम्हा सृष्टीचे निर्माते, विष्णु पालनकर्ते तर महेश संहारकर्ते. विश्वाचा मित्र व सहाययक सूर्य, कर्म घडविणारी मोहरुपी आदीशक्ती मनाचं नियंत्रण करणारी... हे पांचही ब्रम्हरुप ईश्वर म्हणजे "गण" या गणाचा पती म्हणजेच नेता.. गणपती!
निर्माता, संहार व पालन करणारा, कर्म घडविणारा, मनावर नियंत्रंण ठेवणारा गजानन म्हणुन तो पुर्णब्रम्ह व सर्वश्रेष्ठ आहे.
शंकराचं कैलास, इंद्राचा स्वर्ग, काशी व इतर क्षेत्रांचा नाश होऊ शकतो परंतु श्रीमयुरेश्वरक्षेत्र अविनाशी आहे. हे क्षेत्र पृथ्वीवर असुनसुध्दा स्वर्गापेक्षा जास्त पवित्र व शक्तीशाली आहे. स्वतःची निर्मिती स्वतः करण्याची शक्ती असलेलं सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेवाहुन मयुरेशक्षेत्र श्रेष्ठ असल्याचं अनेक वेदांनी व शास्रांनी सिध्द केलं आहे.
विश्वविलासिनी महामाया, जी सत्तेची मालकीन या अविनाशी क्षेत्रापासुन दूर होताच तिच्या हातून सत्ता गेली. विश्व सृष्टी निर्माण करायहा सत्ता मिळावी म्हणुन तिनं ध्यान करुन तपश्चर्या केली. तिच्या त्या तद्रुप भूमिकेलाच भूस्वानंदक्षेत्र ही संज्ञा प्राप्त झाली, तेच हे भूस्वानंद म्हणजेच मयुरेश्वरक्षेत्र. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न् होऊन ऐश्वर्यसंपन्न होशील असा गणेशाने "वर" दिला.
महाशक्ती असणारी सुखकर्ता, दुःखहर्ता गणेशाने भक्तांना दर्शन देण्याकरितां, त्यांना कार्य करण्याची स्फुर्ती व कार्यात यश देणारी सिध्दी मिळावी, स्वमहिमारुप, स्वयंज्योतिर्गमय, साक्षात सयंवेदब्रम्ह, स्वस्वानंद, मायाधिष्ठानरुप, स्वानंदब्रम्ह जे मयुरेश्र्वर या पवित्र जागु भक्तांच्या रक्षणासाठी येऊन राहिले
भूत्वानंद क्षेत्ररुप ठरलेली भूलोकावरील सर्वात जास्त आनंद देणारी व सृष्टीवर नियंत्रण ठेवणारी जागा म्हणजेच मोरगावचे मयुरेश्वरक्षेत्र!
वेदामधे शक्ती, सूर्य, विष्णु व शिव या चार उपासना करणार्या देवतांचा निवास भूस्वानंद क्षेत्राच्या चारही दाराजवळ आहेत. श्रीमयुरेश्वर क्षेत्राच्या चार दिशांना जी चार दारं आहेत त्याच्या ह्या देवता आहेत. साक्षात आत्मस्वरुप परब्रम्ह, ब्रम्हणस्पती म्हणजेच गणेश हा त्यांचा नायक!
ऋग्वेदामधे " मंद्रेरिंद्रहरी भिः या मंत्रामधे ही माहिती असुन ती प्रमाणसिध्द आहे. साक्षात्स्वसंवेद्यस्वरुप, स्वानंद महिमा, साक्षात्किरण ब्रम्हरुप असा हा स्वानंदलोक, त्याचेच प्रतिबिंब म्हणजेच श्रीभूस्वानंक्षेत्र किंवा मयुरक्षेत्र होय.
काही काळाने भाविकांच्या पातकामुळे देवतांना मालिन्य येऊ लागल्याने, स्वतःचे निर्मल्यत्व अक्षय रहावं म्हणुन गणेशाची प्रार्थना करुन मोरेगांव येथील मयुरेशक्षेत्री राहण्याची परवाणगी देवतांनी मागीतली. मयुरेश्वरक्षेत्री वास्तव्य झाल्याने सर्व देवतांचे पावित्र्य कायम राहिले. विश्वामधे काशी प्रयागादी क्षेत्रे प्रसिध्द आहेतच, ती सर्व मूलस्वरुपाने व पुर्णसामर्थ्याने मयुरेशक्षेत्री आहेत.
पंचेश्वराची उत्पत्ती झाल्यानंतर सामर्थ्यप्राप्तीसाठी पांच देवांनी आत्मस्वरुपाचे ध्यान करुन तपश्चर्या केल्याने ते गजाननाशी एकरुप झाले. ब्राम्हणस्पती स्वरुप गणेशाचा साक्षात्कार त्यांच्या ह्रदयात प्रगट झाला.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
भाग--६.
पंचदेवांना ध्यानस्थितीत गणेशाचे जे दर्शन झाले ते प्रत्यक्षात घडावं अशी प्रार्थना केली, तेव्हा आकाशवाणी झाली की, गुरुच्या सानिध्यात गेल्याशिवाय योग्य ज्ञान व दर्शन होऊ शकत नाही. तरी भक्तश्रेष्ठ श्रीभ्रुशुंडीयोगांद्राच्या अमलाश्रमात जाऊन त्याला शरण जा.
पंचदेव अमलाश्रमांत श्रीभ्रुशुंडीचे दर्शन घेतल्यावर त्यांना समग्र गणेशज्ञान देऊन म्हणाले, "पंचदेव हो! जीथे आत्मस्वरुपाचं ध्यान केले त्यावेळी देवबलाने साक्षात्कार होऊन श्रीगणेशाचं दर्शन झाल तिथे परत जाऊन ध्यानात दिसलेल्या मूर्तीची स्धापना केल्यास गजाननाचं दर्शन होऊन कृतार्थ व्हाल."
वेदांनी सांगीतलेल्या भूस्वानंद अर्थात मयुरेशक्षेत्री मोरगांवला मुख्याधिष्ठान स्थळी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पंचेश्वरांनी गजाननाची मुर्तीप्रतिष्ठा केली. पांच महिण्याने माघ शुक्ल चतुर्थीला मयुरावर विराजमान असलेल्या गणेशाने प्रसन्न होऊन पंचश्वरांना सृष्टी व सत्ता दिली, माया म्हणजे मयुरा, तिच्यावर नियंत्रण ठेवणारा तो मयूरेश! पुढे या जागेला मोरगाव आणि मोरगांवचे क्षेत्राधिपती श्रीगजानन यांना मयूरेश नांव पडले.
मयूरेशक्षेत्राचे महात्म्य अमोघ, परिणामी, अतुल व फलदायी आहे. या विषयी एक कथा प्रसिध्द आहे. सुप्रतिक नांवाचा एक तरुण तिर्थयात्रेच्या निमित्ताने यात्रेकरुमधे मिसळुन त्यांना लुबाडणे, त्यांचा घात, खुण, दरोडे ही सर्व पापे तो करीत असे. एकदा चोरी करण्याच्या उद्देशाने यात्रेकरु मंडळीबरोबर पुराण कथा ऐकायला बसला असतां त्यावेळी स्कंद पुराणातील मयुरेशक्षेत्राचे महात्म्य सांगीतल्या जात होते. मयुरेशक्षेत्राच्या वर्णनात एवढी शक्ती आहे की, सुप्रतिकाच्या अंतःकरणात एकाएकी बदल झाला. त्याचा एकदम कायापलट झाला. पुराणिकांनी त्याला या क्षेत्राचं महात्म्य ऐकवल. आणि काय आश्चर्य! ज्याच्या ठीकाणी थोडीसुध्दा पुण्यबुध्दी उत्पन्न होण्याचा संभव नव्हता, त्या सुप्रतिकाने पश्चातापदग्ध होऊन मयुरेशक्षेत्री कायमचा आश्रय घेतला.
श्रीभ्रूशुंडीमहाराज व पंचदेव यांचा संवाद सुरु असतांना पंचदेवांनी विचारले, "इतर क्षेत्र विनाशी तर मग मोरेश्वरक्षेत्रच अविनाशी कसे?" गणेश जो स्वानंद, पुर्णब्रम्ह्य स्वरुप, त्याने स्वतःकरितां निर्माण केलेले असल्यामुळे हे मयुरेशक्षेत्र अविनाशी आहे. इथुनच इतर क्षेत्र व ब्रम्हाडांची निर्मिती झाली. याचा विनाश झाला तर सृष्टी पुनः निर्माण होणारच नाही. याच क्षेत्री योगिंद्रमहाराजांनी गणेशविजय नांवाचा ग्रंथ लिहिला.
गणेशाच्या निःश्वासापासुन उत्पन्न झालेले आदिगुरुस्वरुप असे वेद, गणेशाच्या आज्ञेवरुन पांच देवांना देण्यास सांगीतले असतां त्यांना दिव्यदृष्टी देऊन ब्रम्हसत्ता ज्योतीस्वरुप असे श्रीमयुरेश क्षेत्र दाखविले.
श्रीमयुरेश क्षेत्राचं साक्षात ब्रम्हस्वरुप वेदात व गणेशविजय ग्रथांत सुध्दा सांगीतले आहे. हे क्षेत्र सार्वभौमस्वरुपाचे, स्वयंभू व समर्थ क्षेत्र आहे. सर्व क्षेत्रांचे, सत्तेचे, क्षेत्रप्रकाशाचे मुळ हेच असुन ब्रम्हा विष्णु, शिव शक्ती सुर्यादी पंचेश्वरांनीही श्रेष्ठ मानले. श्रीमौदगल पुराणाच्या सहाव्या खंडात श्रीगणेशाने प्रसन्न होऊन समग्र क्षेत्रदेवतांना वरदान दिल्याचा उल्लेख आहे.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
संकल्य, देशकाल, अथर्वशिर्षासह परिपूर्ण गणेश पूजा.*
*🎆@#अथ पार्थिव गणेश पूजन🎆*
*🔹आपण घरी गणपती आणून पूजा करतो, त्यावेळेस पुढील पूजा करतांना काही बाबी ध्यानात घेणे गरजेचे आहे की, मूर्ती शाडूची व रंग पाण्याचे असल्याने अभिषेक किंवा पाण्यासंबंधीचे उपचार करतांना ते दुर्वा किंचित पाण्यात बुडवून नाममात्र करावेत...*
*🔹योग्य मुहूर्तावर मूर्ती आणावी...*
*🔹स्थापना करण्याचे ठिकाणी धान्याची राशी करुन त्यावर मूर्ती पाटासह ठेवावी...*
*🔹पूजेचे सर्व साहित्य असलेले ताट, पूजेची भांडी जवळ ठेवावीत...*
*🔹शांत चित्ताने व प्रसन्न मुद्रेने पूजारंभ करावा.*
*🔹दिप, अगरबत्ती प्रज्वलीत करून पूजा सुरू करावी...*
*🔹महत्वाची बाब म्हणजे मी मूर्तीची पूजा करीत नसून प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करत आहे, अशी भावना असावी...*
*@#🙏सदानंद पाटील, रत्नागिरी.🙏*
*🌺मंगल तिलक...*
*(गुरुजींनी यजमानांच्या कपाळी गंध, अक्षता लावाव्यात. (यजमान स्वत:च पूजा करत असतील तर त्यांनी स्वत:च स्वत:च्या कपाळी मध्यमेने गंध, अक्षता लावाव्यात.) या वेळी पुढील मंत्र म्हणावा.*
*ओम् भद्रंकर्णेभि: श्रुणुयाम देवा: । भद्रं पश्येमाक्षभिर्य जत्रा: । स्थिरैरंगैतुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायू: । ओम् स्वस्तिन: इंद्रो वृध्दश्रवा: स्वस्तिन: पूषा विश्ववेदा: । स्वस्तिन: स्तार्क्षो अरिष्टनेमि:। स्वस्तिनो ब्रहस्पतिर्दधातु ।। ओम् शान्ति: शान्ति: शान्ति: ।।*
🌺 *आचमन...*
*ॐ केशवाय नमः । ॐ। नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः ।(या नावांनी आचमन करावे)*
*ॐ गोविंदाय नमः ।*
*(या नावाने पाणी सोडावे. पुढील नावे हात जोडून म्हणावीत. नंतर प्राणायाम करावा.)*
*ॐ विष्णवे नमः ।*
*ॐ मधुसूदनाय नमः ।*
*ॐ त्रिविक्रमाय नमः ।*
*ॐ वामनाय नमः ।*
*ॐ श्रीधराय नमः ।*
*ॐ हृषीकेशाय नमः ।*
*ॐ पद्मनाभाय नमः ।*
*ॐ दामोदराय नमः ।*
*ॐ संकर्षणाय नमः ।*
*ॐ वासुदेवाय नमः ।*
*ॐ प्रद्युम्नाय नमः ।*
*ॐ अनिरुद्धाय नमः ।*
*ॐ पुरुषोत्तमाय नमः ।*
*ॐ अधोक्षजाय नमः ।*
*ॐ नारसिंहाय नमः ।*
*ॐ अच्युताय नमः ।*
*ॐ जनार्दनाय नमः ।*
*ॐ उपेन्द्राय नमः ।*
*ॐ हरये नमः ।*
*ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः ।*
🌺 *प्राणायाम...*
*प्रणवस्य परब्रह्म ऋषिः । परमात्मा देवता । दैवी गायत्री छंदः । प्राणायामे विनियोगः ।ॐ भूः ॐ भुवः ॐ स्वः ॐ महा ॐ जनः ॐ तपः ॐ सत्यम् । ॐ तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात ॥ ॐ आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ॥ (दोन्ही कान (प्रथम उजवा) व तोंडास उजव्या हाताच्या पांचही बोटांनी स्पर्श करावा)*
*🌺 देवतास्मरण...*
*हात जोडून सावकाश म्हणावे,*
*ॐ श्रीमन्महागणाधिपतये नमः । श्री मातृपितृभ्यो नम: ।श्री कुलदेवताभ्यो नमः । श्री इष्ट देवताभ्यो नम:। श्री ग्रामदेवताभ्यो नमः । श्री स्थानदेवताभ्यो नमः । श्री वास्तुदेवताभ्यो नमः श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नम: । श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । निर्विघ्नमस्तु । सुमुखश्वैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः । लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ॥१॥ धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः । द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि ॥२॥ विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा । संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥३॥ शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं । प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशांतये ॥४॥ सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥५॥ सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममंगलम् । येषां हृदिस्थो भगवान्मंगलायतनं हरिः ॥६॥ तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव ।विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥७॥ लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः ।येषामिंदीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः ॥८॥ विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् । सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकामार्थसिद्धये ॥९॥ अभीप्सितार्थसिद्धयर्थ पूजितो यः सुरासुरैः ।सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥१०॥ सर्वेप्रारंभ कार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः । देवां दिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ॥११॥*
*🌺देश कालाचा उच्चार...*
*श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्यास्मिन् ब्रम्हांडे भुर्लोके, ब्रह्मणो द्वियीये परार्धे विष्णुपदे, श्री श्वेत वाराह कल्पे, वैवस्वतमन्वन्तरे, अष्टाविशती तमे युगे, युग चतुष्के, कलियुगे, प्रथमचरणे, जंबुद्वीपे, भरत वर्षै, भरत खंडे, दक्षिणापथे, राम क्षेत्रे, बौध्दावतारे, दण्डकारण्ये देशे, शालिवाहन शके अस्मिन वर्तमाने, गोदावर्याः दक्षिण/उत्तर तीरे, विश्वावसुनाम संवत्सरे, दक्षिण अयने, शरदऋतौ, भाद्रपदमासे, शुक्लपक्षे, चतुर्थि तिथौ, बुधवासरे, चित्रा दिवस नक्षत्रे, कन्या राशीस्थिते वर्तमान चंद्रे (१९.२१ नंतर तुला), सिंह राशिस्थिते श्री सूर्ये, मिथुन राशिस्थिते देवगुरौ, शेषेषु ग्रहेषु यथायथं राशीस्थान स्थितेषु सत्सु एवंगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ ।*
*🌺संकल्प...*
*( हातावर पाणी, अक्षता घेऊन पुढील संकल्प म्हणून ताम्हानात पाणी सोडावे)*
*ममआत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य, आयु:, आरोग्य वृध्यर्थम्, भाद्रपदशुक्लचतुर्थ्या प्रतिवार्षिकं विहितं, यथाशक्ति, यथाज्ञानेन, यथा मीलितोपचारद्रव्यैः, ध्यानावाहनादि षोडशोपचारैः कृत पूजनम् करिष्ये । तथा च कलश, शंख, घंटा, दीप पूजनम् तदंगत्वेन शरीर शुध्यर्थम षडंग न्यास अहं करिष्ये।*
*🌺शुध्दीकरण*🌺
*🔹आसन शुध्दी...*
*(यजमानाने आपल्या आसनाला दोन्ही हात उताणे लावावेत, व पुढील मंत्र म्हणावा.)*
*पृथ्विती मंत्रस्य मेरुपृष्ठा ऋषि । कुर्मो देवता । सुतलं छंद: । आसने पवित्र करणे विनियोग: । ओम् पृथ्वि तया धृता लोका देवित्वं विष्णुना धृता । त्वं च धारय मां देवी पवित्र कुरूचासनम् ।*
*🔹परिसर शुध्दि...*
*(हातात अक्षता घेऊन पुढील मंत्राने त्या आठही दिशांना फेकाव्यात)*
*ॐ अपसर्पंतु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया ।।*
*(पुढील मंत्र म्हणून जमीनीस आपली टीच (वीत) लावावी)*
*भूमौ प्रादेशं कुर्यात ।*
*(पुढील मंत्र म्हणून कालभैरवाला नमस्कार करावा व डाव्या पायाची टाच तीन वेळा जमीनीवर आपटावी)*
*तीक्ष्ण दंष्ट्र महाकाय कल्पांत दहनोपम । भैरवाय नमस्तुभ्यम् अनुज्ञां दातुमर्हसी । इति भैरवानुज्ञां गृहियात् ।।*
*🔹षडंग न्यास...*
*ॐ भूर्भुव: स्व: ह्रदयाय नम: । (उजवा हात छातीस लावावा)*
*ॐभूर्भुव: स्व: शिरसे स्वाहा ।( कपाळाला स्पर्श करावा)*
*ॐभूर्भुव: स्व: शिखायै वषट् ।(शेंडीस हात लावावा)*
*ॐभूर्भुव: स्व: कवचाय हुम् ।(दोन्ही हात डोक्यापासून पायापर्यंत उतरावे)*
*ॐभूर्भुव: स्व: नेत्र त्रयाय वौषट् ।(पहिले, दुसरे व तिसरे बोट दोन्ही डोळे व भ्रु मध्यास लावावेत)*
*ॐभूर्भुव: स्व: अस्त्राय फट् ।(डोक्याभोवती उजवा हात फिरवून टाळी वाजवावी)*
*🌺कलश पूजन...*
*(आपण पूजेकरिता भरून घेतलेल्या कलशाची पूजा करून त्यात गंगा, नर्मदादि पवित्र नद्यांचे जल असावे, अशी प्रार्थना करावी.)*
*ॐ कलशस्य मुखे विष्णु कंठे रूद्र समाश्रित: । मूले त्वस्य स्थितो ब्रम्हा मध्ये मातृगणा: स्मृता: ।। कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्विपा वसुंधरा: । ऋग्वेदोथ: यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण: ।। अंगेश्च सहित: सर्वे कलशं तु समाश्रित: । अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टिकरी तथा ।। आयांतु देवपूजार्थं दुरितक्षयकारका:। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती ।। नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरू । कलश देवताभ्यो नम: ।। सकल पूजार्थै गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि । प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ।। (कलशाला गंध,अक्षता,फूल वाहावे, नमस्कार करावा)*
*🌺शंख पूजन...*
*(पुढील मंत्र म्हणून शंखात पाणी भरावे. शंख त्याच्या जागेवर ठेवून त्यास गंध, फूल, तुलसीपत्र वाहावे. शंखाला अक्षता वाहू नये)*
*शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षो वरूण देवता । पृष्ठे प्रजापतीश्चैव अग्रे गंगा सरस्वती ।। त्रैलोक्ये यानि तिर्थानि वासुदेवस्य चाज्ञया । शंखे तिष्ठांती विपेंद्र तस्माच्छंखं प्रपुजयेत ।। त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृत: करे । निर्मित: सर्वदेवैश्च पांचजन्य नमोस्तूते ।। ओम् पांचजन्याय विद्महे पावमानाय। धीमहि तन्नो शंख प्रचौदयात् ।। शंख देवताभ्योनम: ।। सकल पूजार्थै गंध, पुष्प, तुलसिपत्राणी समर्पयामि । प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ।।*
*🌺घंटी पूजन...*
*(पुढील मंत्र म्हणून घंटीला स्नान घालून गंध, अक्षता, फूल, हळद, कुंकू वाहून नमस्कार करावा)*
*आगमनार्थं तु देवानाम् गमनार्थम् तु राक्षसाम् । कुर्वे घंटीरवं तंत्र देवता आवाहन लक्षणम् ।। घंटी देवतायै नम:। ।। सकल पूजार्थै गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि । हरिद्रा कुंकूम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि ।। प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि । घंटीनादम् कुर्यात् ।। (घंटी वाजवावी)*
*🌺दीप पूजन...*
*(पुढील मंत्र म्हणून दिव्याला गंध, अक्षता,फूल, हळद, कुंकू वाहून नमस्कार करावा)*
*भो दीप ब्रम्हरूपस्त्वं कर्मसाक्षी ह्रविघ्नकृत् । यावत्कर्म समाप्ति: स्यात्तावत्त्वं सुस्थिरो भव । दीप देवतायै नम: ।। सकल पूजार्थै गंधाक्षत पुष्पाणि, हरिद्रा कुंकूम् सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि । प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ।।*
*(पुढील मंत्र म्हणून एका फुलाने कलशातील व शंखातील पवित्र जल पूजा साहित्यासह सर्वत्र शिंपडावे)*
*अपवित्र:पवित्रो वा सर्वावस्थां गतोपिवा । य: स्मरेत्पुंडरिकाक्षं स बाह्याभ्यंतरम् शुचि: ।।*
*🌺प्राणप्रतिष्ठा विधी🌺*
*संकल्प (उजव्या हातावर पळीभर पाणी व अक्षता घेऊन पुढील मंत्र म्हणावा, व नंतर पाणी ताम्हानात सोडावे)*
*आद्य पुर्वोच्चारित एवं गुण विषेशण विषिष्ठायां शुभ पुण्यतिथौ श्री गणेश देवतस्य मूर्तौ प्राणप्रतिष्ठा अहं करिष्ये। (आता हातावर फक्त पाणी घेऊन पुढील मंत्र म्हणावा व नंतर ते पाणी ताम्हानात सोडावे)*
*ॐ अस्य श्री प्राण प्रतिष्ठामंत्रस्य । ब्रम्हा विष्णु महेश्वर ऋषय: । ऋग यजु साम अथर्वण छंदांसि । परा प्राण शक्ति: । आम् बिजम् । ह्रीम् शक्तिम् । क्रौम् किलकम् । श्री गणेश देवतस्य मूर्तौ प्राण प्रतिष्ठापने विनियोग: ।। (आता मूर्तीला दुर्वांकुराने किंचित तूप लावावे व मूर्तीच्या ह्रदयास उजव्या हाताचा स्पर्श करून पुढील मंत्र म्हणावा)*
*ॐ आं ह्रीं क्रौं । ओम् अं यंरंलंवंशंषंसंहंळंक्षंअ: । क्रौं ह्रीं आं । हंस: सोहं श्री गणेश देवस्य जीव इहस्थित: ।।*
*(आता पुन्हा मूर्तीस तसेच तूप लावावे, मूर्तीच्या ह्रदयास स्पर्श करून पुढील मंत्र म्हणावा)*
*ॐ आं ह्रीं क्रौं । ओम् अंयंरंलंवंशंषंसंहंळंक्षं अ: । क्रौं ह्रीं आं । हंस: सोहं । अस्य श्री गणेश देवस्य मूर्तौ सर्वेंद्रियाणी वाङ्ममन: चक्षु: श्रोत्रं जिव्हा घ्राण पाणि पाद उपस्थ आदि सर्वैंद्रियााणि आगत्य सूखं चिरतिठंतु स्वाहा । ॐ असुनिते पुन: अस्मासु चक्षु पुन: प्राण मिहनो देहिभोग । ज्योक पश्येम सूर्यमुच्चरंत मनुमते मृळायन:स्वस्ति । ॐ चत्वीरवाक् परिमिता पदानि तानि विदु:ब्राम्हणा ह्ये मनीषिण:। गुहा त्रीणी निहिता नेङ्ग्यंती तुरीय वाचो मनुष्यावदंति । अस्य श्री गणेश देवस्य गर्भाधानादि पंचदश संस्कार सिध्यर्थम् पंचदश प्रणवावृत्ति करिष्ये ।*
*(आता मनात १५ वेळा ओम्काराचा जप करावा व मूर्तीवर दोन्ही हातांनी सावली करावी, नंतर मूर्तीच्या दोन्ही डोळ्यांना दूर्वांनी तूप लावावे. या वेळी पुढील मंत्र म्हणावा.)*
*ॐ तत् चक्षुर्देवहितं शुक मुच्चरत । पश्येत शरद: शतं । जीवेत् शरद: शतम् ।। सुप्रतिठित वरद:भवत:।*
*(यानंतर देवाला मधुपर्काचा नैवेद्य अर्पण करावा. मधुपर्क = दूध + मध.)*
*🌺षोडषोपचार पूजन🌺*
*🌺ध्यान:- वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।श्रीमन्महागणाधिपतये नम: । ध्यायम् ध्यायामि ।। (हात जोडून म्हणावे....)*
*🌺 (१) आवाहन:-आगच्छ देवदेवेश तेजोराशे जगत्पते | क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तम ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । आवाहनार्थे अक्षताम् समर्पयामि ।। (देवास अक्षता वाहाव्यात.....)*
*🌺 (२) आसन:- नाना रत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितम् | आसनं देवदेवेश प्रीत्या च प्रतिग्रह्यताम् ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । आसनार्थे अक्षताम् समर्पयामि ।। (देवास अक्षता वाहाव्यात....)*
*🌺(३)पाद्यम्:- पाद्यम् ग्रहाण देवेश सर्वक्षेम समर्थ प्रभो । भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोस्तुते ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । पाद्यम् समर्पयामि ।।(दुर्वांकुराने देवाच्या पायांवर पाणी शिंपडावे.....)*
*🌺 (४) अर्घ्यम्:- नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर । नमस्ते जगदाधारे अर्घ्यमेत्प्रग्रह्यताम् । श्रीमन्महागणाधिपतये नम: । हस्तयो: अर्घ्यम् समर्पयामि ।। (देवाच्या उजव्या हातावर दुर्वांकूराने अर्घ्य (गंध, अत्तर, कापूर, फुले, पाणी वाहावे.....)*
*🌺 (५) आचमन:- कर्पुरवासितं तोयं मंदाकिन्या: समाह्रतम् । आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तित ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । आचमनीयम् समर्पयामि ।। (देवाच्या उजव्या हातावर पाणी वाहावे.....)*
*🌺 (६) स्नानम्:- गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलै: । स्नापितोSS सि मया देव तथा शान्तिं कुरूष्व मे । श्रीमन्महागणाधिपतये नम: । स्नानीयम् समर्पयामि ।। (देवाच्या मस्तकावर पाणी वाहावे.....)*
*🌺पंचामृत एकत्रित वाहाण्याचा मंत्र🌺*
*पयो दधी घ्रुतं चैव मधु शर्करयान्वितम् । पंचामृतं मयानितं स्नानार्थं प्रतिग्रह्यताम् ।। (जर पंचामृत एकत्र असेल तर वरील मंत्र म्हणून पंचामृत वाहावे....)*
🌺 *पंचामृत स्नानम्* 🌺
*🌺(१)पयस्नानम्:- कामधेनो: समुद्भुतं देवर्षि पित्रूत्रुप्तिदम् । पयो ददामि ते देव स्नानार्थं प्रतिग्रह्यताम् ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । पय स्नानं समर्पयामि । पय स्नानांतरेण शुध्दोदक स्नानम् समर्पयामि । सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि । प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ।। (देवावर दूध शिंपडावे, नंतर पाणी शिंपडावे, नंतर देवास गंध,अक्षता,फूल वाहावे व नमस्कार करावा.....)*
*🌺 (२) दधी स्नानम्:- चंद्र मंडल संकाशं सर्व देव प्रियं दधी । स्नानार्थं ते मया देव दत्तं तत्पतिग्रह्यताम् ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । दधी स्नानं समर्पयामि । दधी स्नानांतरेण शुध्दोदक स्नानम् समर्पयामि । सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि । प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ।। (देवावर दही शिंपडावे, नंतर पाणी शिंपडावे, नंतर गंध,अक्षता,फूल वाहावे, नमस्कार करावा.....)*
*🌺(३) घ्रुत स्नानम्:- आज्यं सुराणामाहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम् । आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिग्रह्यताम् ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । घ्रुत स्नानं समर्पयामि । घ्रुत स्नानांतरेण शुध्दोदक स्नानम् समर्पयामि । सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि । प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि (देवाववर तूप शिंपडावे, नंतर पाणी शिंपडावे, नंतर गंध, अक्षता, फूल वाहावे, नमस्कार करावा.....)*
*🌺(४) मधु स्नानम्:- सर्वौषधिसमुत्पन्नं पीयुष सद्रुषं मधु । स्नानार्थं ते प्रयच्छामि ग्रह्यतां परमेश्वर ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । मधु स्नानं समर्पयामि । मधु स्नानांतरेण शुध्दोदक स्नानम् समर्पयामि । सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि । प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ।। (देवावर मध शिंपडावा, नंतर पाणी शिंपडावे, नंतर गंध,अक्षता,फूल वाहावे, नमस्कार करावा.....)*
*🌺(५) शर्करा स्नानम्:- इक्षुदंड समुद्भूतं दिव्यशर्करया हरिम् । स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । शर्करा स्नानं समर्पयामि । शर्करा स्नानांतरेण शुध्दोदक स्नानम् समर्पयामि । सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि । प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ।। (देवावर किंचित साखर टाकावी, नंतर पाणी शिंपडावे, नंतर गंध,अक्षता,फूल वहावे, नमस्कार करावा.....)*
*🌺(६) गंधोदक स्नानम्:- ॐ कर्पुरैलासमायुक्तं सुगंधीं द्रव्य संयुतम् । गंधोदकं मया दत्तं स्नानार्थम् प्रतिग्रह्यताम् ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । षष्ठेन गंधोदक स्नानं समर्पयामि । गंधोदक स्नानांतरेण शुध्दोदक स्नानम् समर्पयामि । सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि । प्रार्थनापूर्वक नमस्काराणि समर्पयामि ।। (देवावर गंधोदक (गंधाचे पाणी) शिंपडावे, नंतर गंध, अक्षता, फूल वाहावे, नमस्कार करावा.....)*
🌺 *पंचोपचारे पूजा* 🌺
*१) श्रीमन्महागणाधिपतये नम: । विलेपनार्थे चंदनम् समर्पयामि । आलंकारार्थे अक्षतां समर्पयामि । हरिद्रा - कुंकुम् समर्पयामि ।। (गंध लावावे, अक्षता वाहाव्यात, हळद- कुंकू वाहावे.....)*
*२) श्रीमन्महागणाधिपतये नम: । ऋतुकालोद्भव पुष्पम् समर्पयामि ।। (फुले वाहावीत.....)*
*३) श्रीमन्महागणाधिपतये नम: । धूपम् आघ्रापयामि ।। (अगरबत्ती ओवाळावी.....)*
*४) श्रीमन्महागणाधिपतये नम: । दीपं दर्शयामि ।। (दिवा ओवाळावा.....)*
*५) श्रीमन्महागणाधिपतये नम: । पंचाम्रुत नैवेद्यम् समर्पयामि ।। (पंचामृताचा नैवेद्य अर्पण करावा.....)*
🌺 *नैवेद्यार्पण* 🌺
*सत्यंत वर्तेन परि सिश्चयामि । (असे म्हणून नैवेद्या भोवती पाणी फिरवावे) ओम् तत् सवितुर्वरेण्यम् भर्गोदेवस्य धिमहि धियोयोन: प्रचोदयात् ।*
*ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रम्हणे अम्रुतत्वायाम स्वाहा । मध्यपाणियम् समर्पयामि ।। (असे म्हणून पळीभर पाणी ताम्हानात सोडावे. परत नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व वरील प्रमाणे गायत्री मंत्र, ॐ प्राणाय स्वाहा । इत्यादी म्हणून तीन पळ्या पाणी ताम्हानात सोडावे......)*
*उत्तरापोशनम् समर्पयामि । हस्त प्रक्षालनम् समर्पयामि । मुख प्रक्षालनम् समर्पयामि । करोद्वनार्थे चंदनम् समर्पयामि ।। ( असे म्हणून तीन पळ्या पाणी ताम्हानात सोडावे, देवाला गंध लावावे. पंचोपचार पूजा सांगते प्रित्यर्थ पुढील मंत्र म्हणून एक पळी पाणी उजव्या हातावर घेउन ताम्हानात सोडावे.....)*
*अनेन पूर्वाराधनेन श्रीमन्महागणाधिपतये देवता प्रीयंतां न नम ।।*
*उत्तरे निर्माल्य विस्रुज्य ।। अभिषेको कुर्यात ।। (आत्तापर्यत देवाला वाहिलेली फुले गोळा करून त्यांचा वास घ्यावा व ती फुले (निर्माल्य) उत्तर दिशेला ठेवावी. अभिषेक सुरू करावा.....)*
🌺 *अभिषेक स्नान* 🌺
*श्रीमन्महागणाधिपतये नम: । अभिषेक प्रित्यर्थ गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि । (देवाला गंध, फुल, अक्षता वाहाव्यात. भगवान श्री गणेशांना अथर्वशीर्षाचा अभिषेक करावा.....)*
*🌸अथर्वशिर्ष🌸*
*शांतिमंत्र*
*ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ।। स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: । व्यशेम देवहितं यदायु: ।। ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: । स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: । स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।। ॐ शांति: शांति: शांति: ।। ॐ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि । त्वमेव केवलं कर्ताऽसि । त्वमेव केवलं धर्ताऽसि । त्वमेव केवलं हर्ताऽसि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि । त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ।।१।। ऋतं वच्मि | सत्यं वच्मि ।। २।। अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् । अव पश्चात्तात् | अव पुरस्तात् । अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् । सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ।। ३ ।। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: । त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः ।। त्व सच्चिदानंदाद्द्वितीयोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि । त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।। ४।। सर्वं जगदिदं त्वत्तो जायते । सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति । सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति । सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति । त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: । त्वं चत्वारि वाक्पदानि ।। ५ ।। त्वं गुणत्रयातीत: । त्वं देहत्रयातीत: । त्वं कालत्रयातीत: । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ।। त्वं शक्तित्रयात्मक: । त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् । त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं । रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं । वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं । ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ।। ६ ।। गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम् । अनुस्वार: परतर: । अर्धेंदुलसितम् । तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् । गकार: पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् । अनुस्वारश्चान्त्यरूपम् । बिंदुरुत्तररूपम् । नाद: संधानम् । संहिता संधि: । सैषा गणेशविद्या । गणकऋषि: । निचृद्गायत्रीच्छंद: । गणपतिर्देवता । ॐ गँ गणपतये नम: ।।७।। ॐ एकदंताय विद्महे । वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दंती प्रचोदयात् ।। ८ ।। एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् । रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् । रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् ।। भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् | आविर्भूतं च सृष्ट्यादौ । प्रकृते: पुरुषात्परम् ।। एवं ध्यायति यो नित्यं । स योगीं योगिनां वर: ।।९ ।। नमो व्रातपतये । नमो गणपतये । नम: प्रमथपतये । नमस्तेSस्तु लंबोदरायैकदंताय । विघ्ननाशिने शिवसुताय । श्रीवरदमूर्तये नमो नम: ।। १० ।।*
*फलश्रुति*
*एतदर्थवशीर्षं योSधीते । स ब्रह्मभूयाय कल्पते । स सर्वत सुखमेधते । ससर्वविघ्नैर्न बाध्यते । स पंञ्चमहापापात्प्रमुच्यते सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति । प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति । सायंप्रात: प्रयुञ्जानो अपापो भवति । सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति । धर्मार्थकाममोक्षं च विंदति ।। इदमथर्वशीर्षंमशिष्याय न देयम् । यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति । सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् ।। ११ ।। अनेन गणपतिमभिषिंचति । स वाग्मी भवती चतुर्थ्यामनश्नन् जपति । स विद्यावान भवति | इत्यथर्वणवाक्यम् । ब्रह्माद्याचरणं विद्यात् । न बिभेति कदाचनेति ।।१२ ।। यो दुर्वांकुरैर्यजति । स वैश्रवणोपमो भवति । यो लाजैर्यजति सयशोवान् भवति । स मेधावान् भवति । यो मोदकसह्स्रेण यजति । स वाञ्छितफलमवाप्नोति । यः साज्यसमिद्भिर्यजति । स सर्वं लभते स सर्वं लभते ।।१३।। अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति । सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति । महाविघ्नात्प्रमुच्यते । महादोषात्प्रमुच्यते । महापापात्प्रमुच्यते । स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति । य एवं वेद इत्युपनिषद् ।।१४ ।।*
*शांतिमंत्र*
*ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ।। स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: । व्यशेम देवहितं यदायु: ।। ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: । स्वस्ति न: पूषा विश्ववेदा: स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: ।स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।। ॐ शांति: शांति: शांति: ।।*
*(दुर्वांची अग्रे पाण्यात किंचित बुडवून देवाच्या सर्वांगावर पाणी शिंपडावे. अभिषेकानंतर पुढील प्रमाणे पूजा करावी.....)*
🌺 *उष्णोदक स्नान :- ॐ आपोहिष्ठा मयोभुय स्नानं उर्जे दधातन: । महेरणाय चक्षसे यो व: शिवतमोरसस्तस्य भाजय तेन हन: । श्रीमन्महागणाधिपतये नम: । उष्णोदक स्नानम् समर्पयामि ।।*
*(पळीभर पाणी निरांजनावर गरम करावे, त्यात एक थेंब थंड पाणी टाकावे व दुर्वांने किंचित देवावर शिंपडावे.....)*
🌺 *मांगलीक स्नान :- ॐ काश्मीरागरू कस्तुरी कर्पुर मलयान्वीतं । उद्वर्तन मया दत्तं स्नानार्थे प्रति ग्रह्यताम् । श्रीमन्महागणाधिपतये नम: । सुमांगलीक स्नानम् समर्पयामि ।।*
*( वरील मंत्र म्हणून हळद, कापूर,अत्तर, पाणी एकत्र करून ते किंचित देवावर शिंपडावे.....)*
*🌺(७) वस्त्रम्:- सर्व भूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे । मयोपपादिते तुभ्यं वासासी प्रतिग्रह्यताम् । श्रीमन्महागणाधिपतये नम: । वस्त्रम् समर्पयामि ।। (देवाला वस्त्र अर्पण करावे किंवा अक्षता वाहाव्यात.....)*
*🌺 (८) यज्ञोपवीतम्:- देव देव नमस्तेSस्तू त्राही मां भवसागरात । ब्रम्हसुत्रं सोत्तरियं ग्रूहाण पुरूषोत्तम । श्रीमन्महागणाधिपतये नम: । यज्ञोपवीतम् समर्पयामि ।।* *(देवाला जानवे अर्पण करावे. जानवे नेहमी डाव्या खांद्यावरून घालावे....)*
*🌺 (९) गंधम् :- श्रीखंडं चंदनम् दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनम् प्रतिग्रह्यताम् । श्रीमन्महागणाधिपतये नम: । विलेपनार्थे चंदनम् समर्पयामि ।। (देवाला गंध लावावे....)*
*🌺 अक्षता:- अक्षता स्तण्डुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: । मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर । श्रीमन्महागणाधिपतये नम: । अक्षताम् समर्पयामि ।। (देवाला अक्षता वाहाव्यात.....)*
*🌺 हळद :- हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्य दायिनी । सर्वालंकारमुख्या हि देवी त्वं प्रतिग्रह्यताम् । ऋध्दिसिध्दिसहित श्रीमन्महागणाधिपतये नम: । हरिद्राम् समर्पयामि ।। (देवाच्या चरणी हळद वाहावी.....)*
*🌺 कुंकुम् :- हरिद्राचूर्ण संभूतम् कुंकुमम् कामदायकम् । वस्त्रालंकारणम् दिव्यं देवी त्वं प्रतिग्रह्यताम् । ऋध्दिसिध्दिसहित श्रीमन्महागणाधिपतये नम: । कुंकुमम् समर्पयामि ।। (देवाच्या चरणी कुंकू वाहावे.....)*
*🌺 (१०) पुष्पम् :-माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो । मया ह्रतानिं पूजार्थं पुष्पाणि प्रतिग्रह्यताम् ।। (देवाला फुले, दुर्वा वाहाव्यात.....)*
*🌺 (११) धूपम्:- वनस्पती रसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम: । आघ्रेय: सर्व देवानाम् धूपोSयं प्रतिग्रह्यताम् । श्रीमन्महागणाधिपतये नम: । धूपम् आघ्रापयामि ।। (अगरबत्ती ओवाळावी.....)*
*🌺 (१२) दिपम् :- भक्त्या दीपम् प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निर्याध्दोरादीपोयं प्रतिग्रह्यताम् । श्रीमन्महागणाधिपतये नम: । दीपम् दर्शयामि ।। (दिवा ओवाळावा.....)*
*🌺 (१३) नैवैद्य :- नैवेद्यं ग्रह्यतां देव भक्तिंमे ह्यचलां कुरू । ईप्सितं मे वरं देहि परत्रच परां गतिम् । शर्कराखंड खाद्यानी दधिक्षीर घ्रुतानि च । आहारं भक्षं भोज्यं च नैवेद्यम् प्रतिग्रह्यताम्। (नैवेद्याभोवती पाणी फिरवावे..... ) सत्यंतवर्तेन परिसिंचयामि । ओम् तत् सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि । धियो योन: प्रचोदयात् ।*
*ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रम्हणे अम्रुतत्वायाम् स्वाहा । (पळीभर पाणी ताम्हाणात सोडावे .....)*
*मध्यपानीयम् समर्पयामि । (असे म्हणून परत नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व वरील प्रमाणे, गायत्री मंत्र, ॐ प्राणास स्वाहा ( वगैरे म्हणून तीन पळ्या पाणी ताम्हाणात सोडावे) उत्तरापोशनम् समर्पयामि । हस्त प्रक्षालनम् समर्पयामि । मुख प्रक्षालनम् समर्पयामि । करोद्वर्थनार्थे चंदनम् समर्पयामि ।। (असे म्हणून ताम्हानात तीन पळ्या पाणी सोडावे, देवाला गंध लावावे..... ) श्रीमन्महागणाधिपतये नम: नैवेद्यम् समर्पयामि ।।*
*🌺 तांबूलम्:- पूगीफलं महादिव्यं नागवल्ली दलैर्युतम् । कर्पुरैला समायुक्तं तांबुलम् प्रतिग्रह्यताम् । श्रीमन्महागणाधिपतये नम: । मुखवासार्थे पूगीफलं स तांबूलम् समर्पयामि ।। (समोर ठेवलेल्या विड्यावर पळीने पाणी सोडावे.....)*
*🌺 फलम् : इदम् फलम् मया देव स्थापितम् पुरतस्तव | तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि ।।*
*श्रीमन्महागणाधिपतये नम: । नारिकेल महाफलम् समर्पयामि ।। (समोर ठेवलेल्या नारळाला कुंकू लावावे व पळीने पाणी सोडावे.....)*
*🌺 दक्षिणा :- हिरण्य गर्भ - गर्भस्थं हेमबीजं विभावसो: । अनंत पुण्य फलदमत: शांती प्रयच्छ मे । श्रीमन्महा गणाधिपतये नम: । महा दक्षिणाम् समर्पयामि ।। (विड्यावर ठेवलेल्या दक्षणेवर पळीने पाणी सोडावे.....)*
*🌺 आरती: चंद्रादित्यौ च धरणिर्विद्युदग्नि स्तथैव च । त्वमेव सर्व ज्योतिषीं आर्तिक्यं प्रतिग्रह्यताम् । श्रीमन्महागणाधिपतये नम: । महानिरांजन दीपम् समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.....)*
*🌺 कर्पुर आरती:- ॐ कर्पुरगौरं करूणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं । सदा वसंतं ह्रदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि । कर्पुर पूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदरसंस्थितेन । प्रदिप्तभासा सहसागतेन नीरांजनं ते जगदीश कुर्वे । श्रीमन्महागणाधिपतये नम: । कर्पुरार्तिक्यदीपम् समर्पयामि ।। (कापूर पेटवून ओवाळावा.....)*
*🌺 (१४) नमस्कार:- नमस्ते ब्रम्हरूपाय विष्णुरूपाय ते नम: । नमस्ते रूद्ररूपाय करिरूपाय ते नम: ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । नमस्काराणि समर्पयामि ।। (नमस्कार करावा.....)*
*🌺 (१५) प्रदक्षिणा :- यानि कानि च पापानि जन्मांतर क्रूतानि च । तानि तानि विनश्यंति प्रदक्षिणा पदे पदे ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । प्रदक्षिणाम् समर्पयामि ।। (देवाभोवती किंवा शक्य नसल्यास स्वत: भोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.....)*
*🌺 (१६) मंत्र पुष्पांजली :- ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् | ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: ।। ओम् एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धिमहि तन्नोदंती प्रचोदयात् ।। श्रीमन्महागणाधिपतये नम: । मंत्रपुष्पांजलीम् समर्पयामि ।। (हातात फुले घेऊन वरील मंत्र म्हणून ती फुले देवाला वाहावीत.....)*
🌺 *क्षमाप्रार्थना:-*🌺
*(हात जोडून पुढील प्रार्थना म्हणावी)*
*आवाहनम् न जानामि न जानामि विसर्जनम् । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।। अपराध सहस्त्रं च क्रियते अहर्निशं मया । दासोSयमितिमांमत्वा क्षमस्व परमेश्वर ।। गतं दु:खं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च । आगता सुख संपत्ती: पुण्याच्च तव दर्शनात ।। रूपंदेहि जयंदेहि यशोदेहि द्विशोजहि । पुत्रान् देहि धनंदेहि सर्वकामांश्च देहि मे ।। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर: । यत् पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तू मे ।।*
*(यानंतर पूजेच्या सांगते प्रित्यर्थ पुढील मंत्र हातात पळीभर पाणी घेऊन म्हणावा.....)*
*अनेन मया यथा ज्ञानेन यथा मीलिताेपचार द्रव्यै ध्यानं आवाहनादि षोडशोपचारै: कृत पूजनेन रिध्दी-सिध्दिसहित भगवान श्रीमन्महागणपती देवता परमेश्वर: प्रीयंतां न मम ।।*
*(पाणी ताम्हानात सोडावे.....)*
*तीर्थ प्राशन मंत्र :-*
*(हातावर ताम्हानातील पळीभर पाणी (तीर्थ)घेऊन पुढील मंत्र म्हणून नंतर ते प्राशन करावे.....)*
*अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधि विनाशनम् । श्रीगणेश पादोदकं तीर्थे जठरे धरम्यामहम् । शिरसा धारम्यामहम् ।।*
*कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?*
*गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत... गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात.....*
*गणपती वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने, त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात... गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात.....*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।*
*याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर... हे श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे.*
*गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.*
*देवपूजेची फलप्राप्ती, देवाला काय दिले म्हणजे काय मिळते?*
*१) आवाहन केले = दर्शन लाभते.*
*२) आसन = सुखासन मिळते.*
*३) पाद्य (पाय धूणे) = यश प्राप्ती.*
*४) अर्घ्य (सुगंधीत पाणी) = समाधान प्राप्ती.*
*५) आचमन (गंगाजल) = आनंद मिळतो.*
*६) स्नान घालणे = जिवनात सुख मिळते.*
*७) पंचामृत दिले = माधुर्य व स्नेहप्राप्ती.*
*८) अभिषेक केला = शांतता स्थैर्यप्राप्ती.*
*९) वस्त्र=लाज राखली जाते, अपकीर्ती होत नाही.*
*१०) यज्ञोपवित (जानवे) = मोक्षप्राप्ती(भवसागरातून सुटका)*
*११) गंध = ज्ञानप्राप्ति.*
*१२) फुले = सर्वसुखप्राप्ती.*
*१३) हळद पिंजर = सौभाग्यप्राप्ती.*
*१४) अलंकार = श्रीमंती प्राप्त होते.*
*१५) धूप = कीर्ती प्राप्त होते.*
*१६) दीपदान = ज्ञान व वैराग्यप्राप्ती.*
*१७) नैवेद्य = अन्नाची चणचण कधीच भासत नाही.*
*१८) आरती = प्रसन्नता प्राप्त होते.*
*१९) प्रदक्षणा केली = स्वामित्व लाभते.*
*२०) नमस्कार = विनयशिलता प्राप्त होते(वागण्यात).*
*२१) प्रार्थना = दुर्भाग्य बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.*
*परमेश्वराला सर्व उपचार मनापासुन समर्पण केले तर अहंकार मनात राहत नाही....*
*🔸श्री गणेश अथर्वशीर्ष.🔸*
*श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले... अन्य स्तोत्रांत आधी देवतेचे ध्यान, आणि नंतर स्तुती असते. परंतु श्री अथर्वशीर्षात आधी स्तुती आणि नंतर ध्यान अशी रचना आहे.....*
*शान्तिमंत्र...*
*ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूर्भिर्व्यशेम देवहितं (देवहितैं) यदायु: ||१|| ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदाः | स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२|| ॐ तन्मा अवतु। तद् वक्तारमवतु। अवतु माम्। अवतु वक्तारम् ॐ शांति : शांतिः शांति : |*
*गणपतीचे आधिदैविक स्वरूप...*
*हरी ॐ नमस्ते गणपतये || त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि || त्वमेव केवलं कर्तासि || त्वमेव केवलं धर्तासि || त्वमेव केवलं हर्तासि ||त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि || त्वं ( त्वौं ) साक्षादात्मासि नित्यम् ||१||*
*सत्य कथन...*
*ऋतम् वच्मि || सत्यं ( सत्यौं ) वच्मि || २||*
*रक्षणासाठी प्रार्थना...*
*अव त्वं माम् || अव वक्तारम् || अव श्रोतारम् || अव दातारम् || अव धातारम् || अवानूचानमव शिष्यम् || अव पश्चात्तात् || अव पुरस्तात् || अवोत्तरात्तात् || अव दक्षिणात्तात् || अव चोर्ध्वात्तात् || अवाधरात्तात् || सर्वतो मां पाही पाहि समंतात् ||३||*
*गणपतीचे आध्यात्मिक स्वरूप...*
*त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: || त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममय: || त्वं ( त्वौं ) सच्चिदानंदाद्वितीयोऽसि | त्वं ( त्वौं ) प्रत्यक्षं ब्रह्मासि | त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ||४||*
*गणपतीचे स्वरूप...*
*सर्वं जगदिदं त्वत्तो जायते || सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति || सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति || सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति || त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: || त्वं चत्वारि वाक्पदानि ||५|| त्वं गुणत्रयातीत: | त्वं देहत्रयातीत: | त्वं कालत्रयातीत: | त्वं अवस्थात्रयातीतः । त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् || त्वं ( त्वौं ) शक्तित्रयात्मक: | त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् || त्वम् ब्रहमा त्वम् विष्णुस् त्वम् रुद्रस् त्वम् इन्द्रस् त्वम् अग्निस् त्वं ( त्वौं ) वायुस् त्वम् सूर्यस् त्वम् चंद्रमास् त्वम् ब्रह्मभूर्भुव: स्वरोम् ||६||*
*गणेशविद्या...*
*गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् | अनुस्वार: परतर: | अर्धेन्दुलसितम् | तारेण ऋद्धम् | एतत्तव मनुस्वरूपम् | गकार: पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् | अनुस्वारश्चान्त्यरूपम् | बिंदुरुत्तररूपम् | नादः संधानम् || संहिता (सौंहिता ) संधिः | सैषा गणेशविद्या | गणक ऋषि: | निचृद्गायत्रीछंदः गणपतिर्देवता | ॐ गं गणपतये नम: ||७|| एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दन्ती प्रचोदयात् || ८ || एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् || रदं च वरदं हस्तै: बिभ्राण मूषकध्वजम् | रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् || रक्तगंधानुलिप्तांगम् रक्तपुष्पै: सुपूजितम् | भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् | आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरुषात्परम् || एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनां(उं) वर: ||९||*
*नमन...*
*नमो व्रातपतये नमो गणपतये नम: प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नम: || १० ||*
*फलश्रुति...*
*एतदथर्वशीर्षम् योऽधीते || स ब्रह्मभूयाय कल्पते || स् सर्वविघ्नैर्न बाध्यते || स सर्वत: सुखमेधते || स पञ्चमहापापात्प्रमुच्यते || सायमधीयानो दिवसकृतम् पापन् नाशयति || प्रातरधीयानो रात्रिकृतम् पापन् नाशयति || सायं प्रात: प्रयुंजानो अपापो भवति || सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति | धर्मार्थकाममोक्षं च विंदति || इदम्अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम्|| यो यदि मोहाद्दास्यति || स पापीयान् भवति || सहस्रावर्तनात् यं (यैं) यं काममधीते तं तमनेन साधयेत्||११||अनेन गणपतिं अभिषिंचति || स वाग्मी भवति || चतुर्थ्यामनश्नञ्जपति || स विद्यावान्भवति || इत्यथर्वणवाक्यम्|| ब्रह्माद्यावरणं (णौं) विद्यात्|| न बिभेति कदाचनेति || १२ || यो दूर्वांकुरैर्यजति || स वैश्रवणोपमो भवति || यो लाजैर्यजति || स यशोवान्भवति || स मेधावान्भवति || यो मोदकसहस्रेण यजति || स वांछितफलमवाप्नोति || यः साज्यसमिदभिर्यजति || स सर्वम् लभते स सर्वम् लभते || अष्टौ ब्राह्मणान्सम्यग्राहयित्वा || सूर्यवर्चस्वी भवति || सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति || महाविघ्नात्प्रमुच्यते | महादोषात्प्रमुच्यते || महापापात्प्रमुच्यते || स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति || य एवं वेद इत्युपनिषत् ||१३||*
*शान्तिमंत्र...*
*ॐ सह नाववतु | सह नौ भुनक्तु | सह वीर्यं करवावहै | तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै || ॐ शांति : शांतिः शांति : | ॐ भद्रं कर्णेभि:शृणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: व्यशेम देवहितं यदायु: ||१|| ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न: पूषा विश्ववेदाः | स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||२||*
*ॐ शांति : शांतिः शांति : । इति श्री गणपती अथर्वशीर्ष: समाप्तः ।*
*अर्थ...*
*भगवान श्रीगणेशांना नमस्कार असो.....*
*ॐ हे देवांनो, आम्ही कानांनी शुभ ऎकावे... यजन करणाऱ्या आम्हांस डोळ्यांनी कल्याणच दिसावे. सुदृढ अवयवांनी व शरीरांनी युक्त असलेल्या आम्ही स्तवन करीत करीत देवांनी दिलेलें जे आयुष्य असेल तें घालवावे..... ॥१॥*
*ॐ ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऎकिवांत आहे तो इंद्र आमचें कल्याण करो... सर्वद्न्य व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. ज्याची गती अकुंठित आहे असा तार्क्ष्य (गरूड) आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो..... ॥२॥*
*ॐ तें (श्रीगजाननरूपी तेज) माझें रक्षण करो... पठण करणाराचे रक्षण करो. (पुनश्च सांगतों) तें माझें रक्षण करो व पठण करणाराचे रक्षण करो..... ॥३॥*
*ॐ त्रिवार शांति असो...*
*श्रीगणेश अथर्वशीर्षाचा अर्थ...:*
*ॐ गणांचा नायक असलेल्या तुला नमस्कार असो... तूंच प्रत्यक्ष आदितत्व आहेस. तूंच केवळ (सर्व जगाचा) निर्माता आहेस. तूंच केवळ (विश्वाचे) धारण करणारा आहेस. तूंच केवळ संहार करणारा आहेस. तूंच खरोखर हें सर्व ब्रह्म आहेस. तूं प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस..... ॥१॥*
*मी ऋत आणि सत्य (या परमात्म्याच्या दोन्ही अंगांना अनुलक्षून वरील सर्व) म्हणत आहें..... ॥२॥*
*तूं माझें रक्षण कर. वक्त्याचे (तुझें गुणवर्णन करणार्यारचें) रक्षण कर... श्रोत्याचें रक्षण कर. (शिष्यास उपासना) देणा-याचे (गुरूचें) रक्षण कर. (ती उपासना) धारण करणा-याचे(शिष्याचे) रक्षण कर. ज्ञानदात्या (गुरूंचें) रक्षण कर. शिष्याचें रक्षण कर. मागच्या बाजूनें रक्षण कर. समोरून रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. आणि ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर. अधर दिशेकडून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझें रक्षण कर. रक्षण कर..... ॥३॥*
*तूं ब्रह्म आहेस. तूं चैतन्यमय आहेस. तूं आनन्दरूप आहेस... ज्याहून दुसरें कांहींच तत्व नाहीं असें सत्, चित् व आनंद (या रूपांनी प्रतीत होणारें एकच) तत्व तूं आहेंस. तूं प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू (नाना प्रकारें नटलेल्या विश्वाचें ज्ञान आहेस. तू (सर्वसाक्षीभूत एकत्वाचें) विशिष्ट असें ज्ञान आहेस. ॥४॥ हें सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होतें. हें सर्व जग तुझ्यामुळें स्थिर राहतें. हें सर्व जग तुझ्या ठिकाणींच परत येऊन मिळतें. तूं पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश आहेस. तूं (परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी ही) वाणीची चार रूपें आहेस..... ॥५॥*
*तू (सत्व, रजस् व तमस्) या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस... तू (स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारणदेह) या देहत्रयांच्या पलीकडचा (महाकारण) आहेस. तूं (जाग्रद्वस्था, स्वप्नावस्था व सुषुप्तावस्था) या तीन अवस्थांच्या पलीकडचा (तुर्यावस्थारूप) आहेस. तूं (भूत, वर्तमान व भविष्यत्) या तिन्ही कालांच्या पलीकडचा आहेस. (मनुष्यशरीरांतील) मूलाधारचक्रांत तूं नेहमी स्थित आहेस. तूं (इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति या) तिन्ही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझें नित्य ध्यान करितात. तूं ब्रम्हदेव, तूंच विष्णु, तूंच रूद्र, तूंच इंद्र, तूंच अग्नि, तूंच वायु, तूंच सुर्य, तूंच चंद्र, तूंच ब्रह्म, तूंच भू:, तूंच भुव:, तूंच स्व: व तूंच ॐकार आहेस..... ॥६॥*
*’गण’ शब्दाचा आदिवर्ण ‘ग्’ याचा प्रथम उच्चार करून वर्णांतील प्रथमवर्ण ‘अ’ याचा उच्चार केला... त्याचे समोर अनुस्वार अर्ध्चंद्राकार शोभणार्याा ॐकारानें युक्त (असा उच्चार केला कीं) हें तुझ्या बीजमन्त्राचे (ग्ँ) रूप होय. गकार हें पुर्वरूप, अकार मध्यरूप, अनुस्वार अन्त्यरूप व (प्रणवरूप) बिंदु (हें पुर्वीच्या तिन्हींना व्यापणारें) उत्तररूप होय. या (सर्वां) चे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचें एकत्रोच्चारण म्हणजेच सन्धि. (अशा रीतीनें बीजमन्त्र सिद्ध होणें) हीच ती गणेशविद्या. (या मंत्राचा) गणक ऋषी आहे. (या मंत्राचा) निच्ऋद्गायत्री हा छन्द (म्हणण्याचा प्रकार) आहे. गणपति देवता आहे. ‘ॐ गं गणपतये नम:।‘ (हा तो अष्टाक्षरी मन्त्र होय.....) ॥७॥*
*आम्ही एकदन्ताला जाणतों. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतों... त्यासाठी एकदन्त आम्हांस प्रेरणा करो. ॥8॥ (या भागास गणेशगायत्री असे म्हणतात.....) ॥८॥*
*एक दांत असलेला, चार हात असलेला, (उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून प्रदक्षिणाक्रमानें त्याच बाजूच्या खालच्या हातापर्यंत) अनुक्रमें पाश, अंकुश, दांत व वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचें चिह्न असणारा, तांबड्या रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, तांबड्या (रक्तचंदनाच्या) गन्धानें ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचें उत्तम पूजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचें कारण असणारा, अविनाशी, सृष्टीच्या आधींच प्रगट झालेला, प्रकृतिपुरूषापलीकडचा देव, असें जो नित्य ध्यान करतो तो योगी, (किंबहुना) योग्यांत श्रेष्ठ होय..... ॥९॥*
*व्रतांचा समूह म्हणजेच तपश्चर्या. तिच्या अधिपतीस नमस्कार असो... गणांच्या नायकार नमस्कार असो. सर्व अधिपतींतील प्रथम अधिपतीस नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत अशा श्रीवरदमुर्तीला नमस्कार असो..... ॥१०॥*
*या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मरूप होतो... त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अज़ाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळीं पठण करणारा रात्रीं (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहित होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी अशा अनधिकार्याीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल..... ॥११॥*
*या अथर्वशीर्षानें जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें वाक्य आहे... (याचा जप करणा-याला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं. ॥१२॥ जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होतें..... ॥१३॥*
*आठ ब्राह्मणांना योग्य प्रकारें (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपति प्रतिमेसन्निध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो... (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हें असें जाणतो..... असें हें उपनिषद् आहे..... ॥१४॥*
*🔸गणपतीच्या पूजेतील २१ पत्री.🔸*
*भारतीय संस्कृतित पूजेत वाहण्यात येणारी फुले, पाने यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे... विविध देवतेनुसार पूजा साहित्यामध्ये बदल बघावयास मिळतो. गणपतीच्या पूजेत २१ पत्रीचा समावेश असतो. या पत्रींचे औषधी गुण आपण जाणून घेऊया.....*
*🔸१:पिपंळ – याला ‘बोधीवृक्ष’ म्हणतात. गौतम बुध्दांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले होत... हवा शुध्दकरण्यासाठी हे एकच झाड एअरकुलर सिस्टीमच्या पाचपट अधिक काम करते. याच्या पानांत औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेऊ घातले जाते. पिपंळाची लाख (राख) खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते.....*
*🔸२:केवडा – ही वनस्पती समुद्र किनार्यावर मोठया प्रमाणात आढळते... ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.....*
*🔸३:हादगा – हादग्याला आपण ‘अगस्ती’ म्हणूनही ओळखतो... याच्या फुलांची भजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे.....*
*🔸४:बोर – बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्यांवर लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.....*
*🔸५:मधुमालती – मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्ये सहज बघावयास मिळते. ही एक काष्ट वेल आहे. गुलाबी, पांढर्या, पिवळया रंगाची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्टय. फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.....*
*🔸६:माका – पावसाळयात आढळणारी ही वनस्पती डोंगर – टेकडयांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते.....*
*🔸७:बेलपत्र – शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.....*
*🔸८:धोतरा – धोतर्याचा काळा, पांढरा, व राजधोतरा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचे औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती पडिक जागेत उगविणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी पांढर्या लांब नरसळ्यासारखे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या वनस्पतींची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात.....*
*🔸९:तुळस – ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीत राम, कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक दंश तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो.....*
*🔸१०:दुर्वा – ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी (श्वेत) आणि निळा (नील) या दोन जाती आहेत. पांढ-या दुर्वा गणेशाला प्रिय असते. आपल्याकडे तिला ‘हरळ’ म्हणतात. नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस अमृतासमान असतो. दूर्वा रस्त्याच्या बाजूला, बागेतही मिळतात.....*
*🔸११: शमी – शमीला सुप्त ‘अग्नीदेवता’ असेही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात. हा वृक्ष कोरडया हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी ठरते.....*
*🔸१२: विष्णुकांता – या वनस्पतीला आपल्याकडे ‘शंखपुष्पी’ म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर-टेकडया आदी ठिकाणी ही आपण बघू शकतो.....*
*🔸१३: आघाडा – ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे. ही वनस्पती पडिक जागेत माळरानांवर बघावयास मिळते.....*
*🔸१४:डाळिंब – आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती मोठयाप्रमाणात बघावयास मिळतात. देखणी फुले, काहीसे काटेरी झुडूप आहे. याचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही उपयोग केला जातो.....*
*🔸१५: डोरली – या रोपाला ‘काटे रिंगणी’ म्हणूनही ओळखतात. या वनस्पतीच्या पानवर देखील काटे असतात. त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरते. आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते....*
*१६ :देवदार – हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट, हिमालयात आढळतो. या वृक्षाचे लाकूड अतिशय मजबूत असते. कफ, पडसे, संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो. याची झाडे महाराष्ट्रात नाशिकजवळ पेठ, हरसूल भागात देखील दिसतात.....*
*🔸१७: कण्हेर – कण्हेरीची पाने व मुळाचा साठा औषधी आहे. परस बागेतही हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे. याच्या फुलांना सुगंध असतो. वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो.....*
*🔸१८: मारवा – ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा, भाजणे, किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. नवीन संशोधनात तर मारव्यापासून कर्करोगावर औषध तयार करण्यास यश आले आहे. ही वनस्पती घरात कुंडीतदेखील लावता येते.....*
*🔸१९: रूई – रुई या वनस्पतीला ‘मांदार’ म्हणूनही ओळखतात. ओसाड जागेत ही वनस्पती मोठया प्रमाणात दिसते. हिला पांढर्या, जांभळया रंगाची फुले येतात. हत्तीरोगावर हे फार उत्तम औषध आहे. तसेच कुष्ठरोगावर देखील त्याचे औषध प्रभावी ठरते. पांढरी रूई गणेशाला अधिक प्रिय असते.....*
*२०: अर्जुन – हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी पट्टयात हिला ओळखतात. या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.....*
*🔸२१: जाई – या वनस्पतीला जास्मीन देखील म्हणतात... ही वनस्पती शहरात मोठया प्रमाणात दिसते. तोंड आल्यावर जाईची पाने खातात, तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो. ही वेल सुगंधी फुलांची आहे.....*
*स्रोत: आंतरजाल, Marathi world.com*
*🔸गणपतीची १०८ सार्थ नावे.🔸*
*भालचन्द्र : ज्याच्या कपाळावर चंद्र आहे.*
*बुद्धिनाथ: बुद्धी ची देवता.*
*धूम्रवर्ण : ज्यांचा वर्ण धूम्र आहे.*
*एकाक्षर: एकच अक्षर.*
*एकदंत: एकच दात असणारे.*
*बालगणपति: सगळ्यात प्रिय बाळ.*
*गजकर्ण: हत्ती समान कान असणारे.*
*गजानन: हत्ती समान मुख असणारे.*
*गजवक्र: हत्ती समान वक्राकार सोंड असणारे.*
*गजवक्त्र: हत्ती समान मुख असणारे.*
*गणाध्यक्ष: सर्व गणांचे स्वामी.*
*गणपति: सर्व गणांचे स्वामी.*
*गौरीसुत Gaurisut आई गौरीचे पुत्र.*
*लंबकर्ण: ज्याचे कान लांब आहेत.*
*लंबोदर: ज्याचे पोट मोठे आहे.*
*महाबल Mahaabal अत्यंत बलशाली.*
*महागणपति: देवाधिदेव.*
*महेश्वर: संपूर्ण ब्रह्मांडाचे देव.*
*मंगलमूर्ति Mangalmurti सर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे.*
*मूषकवाहन: ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे.*
*निदीश्वरम: धन संपत्ती देणारे.*
*प्रथमेश्वर: सर्वात प्रथम येणारे देव.*
*शूपकर्ण: सुपाएवढे कान असणारे.*
*शुभम: सर्व शुभ कार्यांचे देवता.*
*सिद्धिदाता: इच्छा पूर्ण करणारे देवता.*
*सिद्धिविनायक: सफलता चे देवता.*
*सुरेश्वरम: देवांचे देव.*
*वक्रतुंड : वक्राकार तोंड असणारे.*
*अखूरथ: ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे.*
*अलंपत: अनंतापर्यंत असणारे देव.*
*अमित: अतुलनीय देवता.*
*अनंतचिदरुपम : अनंत व्यक्ती चेतना असणारे.*
*अवनीश : संपूर्ण विश्वाचे स्वामी.*
*अविघ्न : संकटांना दूर करणारे.*
*भीम: भव्य.*
*भूपति : धरतीचे स्वामी.*
*भुवनपति : देवांचे देव.*
*बुद्धिप्रिय: ज्ञानाची देवता.*
*बुद्धिविधाता: बुद्धीचे स्वामी.*
*चतुर्भुज: चार हात असणारे.*
*देवादेव : सर्व देवाचे देव असणारे.*
*देवांतकनाशकारी: वाईट राक्षसांचे विनाशक.*
*देवव्रत: सर्वांची तपस्या स्वीकारणारे.*
*देवेन्द्राशिक: सर्व देवांचे रक्षण करणारे.*
*धार्मिक : दान करणारे.*
*दूर्जा: कधी न पराजित झालेले देव.*
*द्वैमातुर : दोन आई असणारे.*
*एकदंष्ट्र: एकच दात असणारे.*
*ईशानपुत्र: शंकराचे पुत्र.*
*गदाधर: ज्यांचे गदा हे शस्र आहे.*
*गणाध्यक्षिण : सर्वांचे देवता.*
*गुणिन : सर्व गुणांचे स्वामी.*
*हरिद्र : स्वर्ण रंग असणारे.*
*हेरंब: आईचा प्रिय पुत्र.*
*कपिल: पिवळा रंग असणारे.*
*कवीश: सर्व कवींची देवता.*
*कीर्ति: यशाचे स्वामी.*
*कृपाकर: सर्वांवर कृपा ठेवणारे.*
*कृष्णपिंगाक्ष: कृष्णासमान डोळे असणारे.*
*क्षेमंकरी: क्षमा करणारे.*
*क्षिप्रा: आराधना करण्यासारखे.*
*मनोमय: मन जिंकणारे.*
*मृत्युंजय: मृत्यूला हरवणारे.*
*मूढ़ाकरम : आनंदात असणारे.*
*मुक्तिदायी: शाश्वत आनंद देणारे.*
*नादप्रतिष्ठित: ज्यांना संगीत प्रिय आहे.*
*नमस्तेतु: वाइटांवर विजय मिळवणारे.*
*नंदन: शंकराचे पुत्र.*
*पाषिण Pashin दगडा सारखे मजबूत असणारे.*
*पीतांबर: पिवळे वस्त्र धारण करणारे.*
*प्रमोद: आनंद.*
*पुरुष : अद्भुत व्यक्ती.*
*रक्त: लाल रंगाच्या शरीराचे.*
*रुद्रप्रिय : शंकरांना प्रिय असणारे.*
*सर्वदेवात्मन: प्रसादाचा स्वीकार करणारे.*
*सर्वसिद्धांत: सफलतेची देवता.*
*सर्वात्मन: बह्मांडाची रक्षा करणारे.*
*शांभवी : देवी पार्वती.*
*शशिवर्णम : चंद्रासमान वर्ण असणारे.*
*शुभगुणकानन: सर्व गुणांची देवता.*
*श्वेता: पांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे.*
*सिद्धिप्रिय: इच्छापूर्ती करणारे.*
*स्कंदपूर्वज : कार्तिकेय ज्याचा भाऊ आहे.*
*सुमुख : शुभ मुख असणारे.*
*स्वरुप : सौंदर्याची देवता.*
*तरुण: ज्यांच्या आयुष्याची सीमा नाही,अमर.*
*उद्दण्ड : नटखट असणारे.*
*उमापुत्र: पार्वतीचा मुलगा.*
*वरगणपति: वर देणारे देव.*
*वरप्रद: वर पूर्ण करणारे.*
*वरदविनायक: यशाचे स्वामी.*
*वीरगणपति : वीर देवता.*
*विद्यावारिधि Vidyavaaridhi विद्या देणारी देवता.*
*विघ्नहर: संकट दूर करणारे.*
*विघ्नहर्ता: संकट दूर करणारे.*
*विघ्नविनाशन : संकटांचा अंत करणारे.*
*विघ्नराज : सर्व संकटांचे स्वामी.*
*विघ्नराजेन्द्र : सर्व संकटांचे स्वामी.*
*विघ्नविनाशाय: संकटांचा नाश करणारे.*
*विघ्नेश्वर : संकट दूर करणारे.*
*विकट : भव्य.*
*विनायक: सर्वांचे देवता.*
*विश्वमुख: संपूर्ण विश्वाचे देवता.*
*यज्ञकाय : सर्व यज्ञा स्वीकार करणारे.*
*यशस्कर : यशाचे स्वामी.*
*यशस्विन: सर्वात लोकप्रिय देवता.*
*योगाधिप : ध्यानाची देवता.*
*स्रोत: आंतरजाल, marathimindset.com*
*🔸श्रीपाद श्रीवल्लभ.🔸*
श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, पिठापूर...*
*चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्रीगणेश आणि भगवान दत्तात्रेयांचा आद्य अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ या दोघांचाही जन्म भादपद शुक्ल चतुथीचा, उत्पत्ति स्थिती आणि लय या तीनही शक्ती सार्मथ्याच्या पलिकडे असलेले विशिष्ट चतुर्थतत्व ज्यांना ज्ञात आहे असे परमात्मा म्हणून या दोघांचा उल्लेख केला जातो.....*
*श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे... भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२० मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राज शर्मा आणि सुमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. सरस्वती गंगाधर रचित 'श्रीगुरुचरित्र' या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. दत्तभक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्रीनृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे दोन अवातर चांगले माहीत आहेत. पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर श्रीपाद श्री वल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पीठापूरम या त्यांच्या जन्मक्षेत्रांचा थोडक्यात घेतलेला धांडोळा उद्बोधक आणि अनेकांच्या माहितीत नव्याने भर टाकणारा ठरेल अशी अपेक्षा आहे. त्यांचे समकालीन असलेल्या शंकर भट्ट यांनी लिहिलेले चरित्र संस्कृत भाषेत होते आणि नंतर त्याचा तेलुगु भाषेत अनुवाद झाला.....*
*अप्पल राजन व सुमती या दत्तभक्त दाम्पत्याला एकूण चार मुले होती... पण त्यापैकी दोन वारली. तर दुसऱ्या दोघांतील एक अंध व एक पंगू होता. दुर्दैवाच्या अशा दशावतारात संसार चालू असता एके दिवशी भर टळटळीत दुपारी एक अतिथी घरासमोर येऊन भीक्षा मागू लागला. त्याच दिवशी या दाम्पत्याच्या घरी श्राद्ध होते. सुमती एकटीच घरात होती. 'माते भिक्षा वाढ' हा आवाज ऐकून ती बाहेर आली. वास्तविक श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय जेवण वाढता येत नाही अशी पूर्वापार रूढी. पण अतिथी भिक्षीकऱ्याचे तेज:पुंज रूप पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भीक्षा घातली.....*
*अतिथीने प्रसन्न होऊन पाहिजे ते काहीही मागण्याचा आशीर्वाद दिला... आपल्या दोन्ही मुलांच्या अवस्थेमुळे दु:खी असलेल्या सुमतीने 'आपल्या सारख्याच तेजोमय मुलाची मी अपेक्षा करते' अशी विनंती केली. यति वेषात आलेल्या श्री दत्तात्रेयांनी माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन' असे सांगितले. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजेच दत्तअवतारी श्रीपाद श्रीवल्लभ होत.....*
*पिठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे १४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले... त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. पुढे जप, तप, ध्यान, तपस्या या सर्वांचे फल स्वत:ला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्वीव्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्त्रपटीने वाढविले. आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनर्दानाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले.....*
*पाण्यावरून चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते... या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत-सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दृष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत-पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदि अनेक गोष्टींचा संदेश दिला.....*
*आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे या दैवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात विशेषत: वेदान्दात प्रावीण्य मिळविले... नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले.....*
*पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूर्तीच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते... तेथे भक्तांना अभिषेक करता येतो. मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत. पीठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुक्कुटेश्वराचे दगडी मंदिर आहे. त्यासमोरच एक तलाव आहे.....*
*स्त्रोत: विकिपीडिया...*
*🔸 अष्टविनायक 🔸*
*🔸(१)मोरेश्वर (मोरगाव)🔸*
*अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो... मयुरेश्वर मंदिर, मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, आदिलशाही कालखंडात याच बांधकाम केले आहे. पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होत.....*
*मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे... मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभार्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.....*
*असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला... त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.....*
*या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली... म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.*
*सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते... ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.....*
*पुणे रेल्वे स्टेशन पासून मोरगाव, हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४ कि.मी. वर आहे... पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गाव आहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३ कि.मी. आहे.....*
*स्त्रोत: आंतरजाल, विकिपीडिया...*
*🔸गौरी गणपती - शंका समाधान🔸*
*श्रीगणेश स्थापना*
*प्रश्न क्र १ गणेश स्थापना मुहूर्त कोणता ?*
*उत्तर:- गणेश स्थापना हे तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शु. चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्ही पर्यंत कधीही स्थापना करता येते. उशीर होणार असेल, तर दुपारपर्यंत संकल्प करून स्थापना झाली तरी चालेल. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, स्थिर राशींचा कालावधि, भद्रा (विष्टि करण), चौघडीया मुहूर्त (अमृत, लाभ) इत्यादि पाहण्याची गरज नाही.*
*प्रश्न क्र २ घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही ?*
*उत्तर: याला काहीही शास्त्रीय आधार नाही. आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते, अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्या वेळी गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे? असा भोळा समज त्यामागे आहे.*
*प्रश्न क्र ३: अशौच ( सोयर व सुतक ) आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का ?*
*उत्तर : पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे कुलाचार नाही. त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो. पुढील वर्षी बसवता येतो. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शु चतुर्थी हा एकच दिवस असल्याने, त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी अशौच संपत नसेल, तर त्या वर्षी गणपति बसवू नये. येथे स्थापना दिवस महत्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी गणपती स्थापना करता येणार नाही.*
*प्रश्न क्र ४ : आता अशौचामुळे शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रात गणपती बसवला तर चालेल का ?*
*उत्तर:- आश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीस राहिलेले गणपति पूजन करू नये. त्याला काहीही शास्त्राधार नाही. अनेकजण गौरी पण अडचण आल्यास नवरात्रात बसवतात. ते पण शास्र मान्य नाही.*
*प्रश्न क्र ५: यंदा काही कारणामुळे गावी दहा दिवस थांबता येणार नाही तर पाच दिवसात विसर्जन केले तर चालेल का ?*
*उत्तर अडचणीच्या काळात दीड दिवस, तीन, पाच, सात दिवसात विसर्जन करू शकता. गणेश स्थापना झाल्यावर अशौच आले, तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे. अशौच आल्यावर घरात पार्थिव गणपती ठेऊ नये.*
*प्रश्न क्र ६:- मागील वर्षी आम्ही बसवलेली गणेशमूर्ती भंगली होती. मग आम्ही नवीन आणून बसवली. ते योग्य आहे का ?*
*उत्तर: गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली, तर लगेच विसर्जन करावे. दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये. जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसवू शकता.*
*प्रश्न क्र ७ - आमचे वडील स्वर्गवासी झाले, पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का ?*
*उत्तर- चौदा दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देवकार्य करता येते. त्यामुळे आरास न करता, साध्या पद्धतीने व भक्ती भावाने गणेश स्थापना करावी.*
*प्रश्न क्र ८ : आम्ही दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे गौरी गणपतीचा सण साजरा करतो, पण यंदा कोरोनामुळे जाणे शक्य नाही. आम्ही वेगळ्या गौरी गणपती बसवू शकतो का ?*
*उत्तर:- हो... जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत, ज्यांची चूल वेगळी आहे, त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो. प्रतिवार्षिक व महालय श्राद्ध सुद्धा वेगळे करावे लागते.*
*प्रश्न क्र ९:- पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा ?*
*उत्तर:- घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यात, जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे. त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत.*
*प्रश्न क्र १०:- या वर्षी सार्वजनिक गणपती स्थापना करता येत नाही. मग घरामध्ये स्वतःचा एक व सार्वजनिक एक असे गणपती बसवले तर चालतील का ?*
*उत्तर :- गणेशस्थापना हे एक व्रत आहे. त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती. त्यामुळे घरात फक्त वैयक्तिक व्रताचा गणपती बसवावा. दोन गणेशस्थापणा एकाच घरात करू नये.*
*प्रश्न क्र ११:- ज्या घरात /कुटुंबात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानंतर पण गणेशचतुर्थी पुर्वी मृत्यु झाला असेल, त्यांनी गौरी गणपती बसऊ नयेत असे शास्र आहे का ?*
*उत्तर :- पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे. आई वडील गेल्यावर मंगल कार्यासाठी जरी वर्षभर अशौच असले, तरी कोणतेही व्रत, उपासना करण्यास काहीच हरकत नाही. फक्त रोषणाई, समारंभ नको .*
*प्रश्न क्र १२ :- गौरी गणपती मृतकाच्या सुतकाच्या कालावधीत येत असल्यास सुतक संपल्यानंतर लगेच येणाऱ्या चतुर्थीला गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पुजा अर्चा, नैवेद्य वगैरे दाखवुन त्याच दिवशी विसर्जन करुन टाकाव्या का ?*
*उत्तर:- पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे. त्यामध्ये विशिष्ट दिवशीच म्हणजे गणेश चतुर्थीलाच स्थापना करावी लागते. पण उस्थापना दिवस कुळाचाराप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. कुणाकडे एक दिवस, कुणाकडे पाच दिवस तर बहुतेक ठिकाणी दहा दिवस गणपती असतात. त्यामुळे स्थापनेच्या दिवशी अशौच असल्यास त्या वर्षी व्रताचा लोप करावा, पण पुढील वर्षी हे व्रत चालू ठेवावे.*
*प्रश्न क्र १३:- गौरी गणपती बसवल्यावर नंतर घरात मृत्यु घडल्यास मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांच्या आधी गौरी गणपतीचे विसर्जन करून टाकावे का ?*
*उत्तर :- हो... घरामध्ये व्यक्ती मृत झाली की लगेच दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडूनही गणेश विसर्जन करून घ्यावे. गौरी पण कुणाकडून उत्थापणा करून घ्यावी.*
*प्रश्न क्र १४:- विसर्जनाचा दिवस शनिवार आल्यास शनिवारी विसर्जन करु नये. दुसऱ्या दिवशी करावे. असा काही नियम आहे का ?*
*उत्तर:- असा कोणताही नियम धर्मशास्रात नाही. गणेश व्रताचे विधान ठरलेले असते. त्यात बदल करू नये.*
*प्रश्न क्र १५:- गौरी गणपती बसल्यानंतर जर घरातील स्त्री बाळंतीण झाली तर काय करावे? उत्तर:-*
*गणेश स्थापनेनंतर घरात सोयर आले, तर दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडून पुढील पूजा, आरती करून नंतर विसर्जन करावे.*
*प्रश्न क्र १६:- मुर्ती विसर्जनासाठी नेतांना घराबाहेर रस्त्यात भंग पावली तर काय करावे?*
*उत्तर:- स्थापना केलेली मूर्तीची उत्तरपूजा झाल्यावर भंगली तरी दोष नाही. विसर्जित करावी.*
*प्रश्न क्र १७:- चार भाऊ चार वेगवेगळ्या गावी राहातात, तर ते चारही भाऊ आपापल्या घरी स्वतंत्रपणे गौरीगणपती बसऊ शकतात का ? गौरी गणपती अथवा इतर कुळाचार हे आपल्या मुळ गावी मुळ घरातच साजरे केले पाहिजेत असा नियम आहे का?*
*उत्तर:- ज्यांचा अग्नी वेगळा झाला आहे, व्यवहार वेगळे झाले आहेत, देवघर वेगळे आहे, त्या प्रत्येकाला वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो. मूळ गावीच सर्व व्रते करावीत असा कोणताही नियम नाही. एकत्रित का करतात... तर त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य त्या निमित्ताने एकयत्र येऊन आनंदात साजरा करतात, एकमेकांना भेटतात, सुखदुःख वाटून घेतात, आनंदात समारंभ साजरा करतात !*
*🔸गणेशाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती🔸*
*सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी 'ॐ' व 'अ...' असे दोन शब्द ब्रह्मेषाचा कंठ भेदून बाहेर आले.*
*प्रथमत: ॐ असा ध्वनी झाला. या ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. गणपती हा दशदिशांचा स्वामी आहे. त्याच्या परवानगीशिवाय इतर देवतादेखील कोणत्याही दिशेने पूजास्थानी येऊ शकत नाही.*
*गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करतो, ती देवता तिथे येऊ शकते. यालाच महागणपती पूजन असे म्हटले जाते. म्हणूनच कोणतेही मंगलकार्य अथवा अन्य कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीपूजन केले जाते. जगदुत्पत्ती होण्याआधी निर्गुण व कूटस्थ स्वरूपात असलेल्या महततत्त्वास महागणपती असे म्हणतात.*
*ऋद्धी-सिद्धी या गणपतीच्या दोन शक्तीसहित असलेल्या गणपतीस तंत्रशास्त्रात महागणपती असे संबोधले जाते. विशिष्ट सिद्धी अथवा निखळ मोक्ष प्राप्तीसाठी उजवीकडे सोंड असलेल्या महागणपतीची पार्थिव मूर्ती घेण्याची प्रथा आहे.*
*पार्वतीने अंग मळापासून/मृत्तिकेपासून तयार केलेला गणेश हा देखील महागणपतीचा अवतार होय. सांप्रत गणपतीला आपण शिवपरिवारातला समजत असलो तरी शिव व गणेश. या दोन्ही देवता पूर्वी एकरूपच होत्या असेही मानले जाते.*
*भालचंद्र, नागभूषणे व तृतीय नेत्र ही भगवान शंकराची तिन्ही वैशिष्ट्ये गणेशमूर्तीतही आढळतात. महादेवाप्रमाणे गणेशाच्या कमरेभोवती नागबंध आहे. अनलासुराला भक्षण केल्यानंतर झालेला दाह शांत करण्यासाठी शंकराप्रमाणे गणेशानेही शिरी चंद्र धारण केल्याची कथा आहे.*
*'गजवदनम चिंत्यं, तीक्ष्ण दंष्ट्रं त्रिनेत्रम' या श्लोकात गणपतीला त्रिनेत्रधारी म्हटले आहे. गणपती तंत्रानुसार भगवान शंकराने वाजवलेल्या डमरूच्या गंभीर आवाजातून गणेशाने वेदविद्या ग्रहण केली.*
*शंकराचे तांडवनृत्य पाहून गणपती नृत्यकला शिकला व पार्वतीच्या नुपूर झंकाराद्वारे तो संगीत शिकला. आपल्या शरीरात असलेल्या षट्चक्रातील आरंभीच्या मूलाधार चक्रात गणपती नित्य वास करीत असतो. म्हणून गणेशाला मूलाधारचक्राची देवता समजले जाते. मूलाधारचक्र व त्यातील कमळ ही दोन्ही लाल रंगाची आहेत व गणपतीचा रंगही लाल आहे.*
*गणपतीचे वास्तव्य असलेले आरंभीचे मूलाधारचक्र जागृत झाल्यावर आध्यात्मिक उन्नतीस जसा प्रारंभ होतो, तसाच कोणत्याही कामांचा आरंभही गणपतीपूजनाने केला जातो. विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत व नाट्यारंभापासून गृहप्रवेशापर्यंत सर्व विधींच्या आरंभी गणेशपूजन असते.*
*कोणत्याही लेखन कार्यास सुरवात करताना प्रारंभी श्रीगणेशायनम: असे लिहिण्याची पद्धत आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होते व गणपती बुद्धिदाता असल्याने 'श्री गणेशायनम:' असे गणेशाचे प्रथम स्मरण करून मगच आपण इच्छित विषयाकडे वळतो.*
*'महाभारत लिहिण्यासाठी महर्षी व्यासांनी बुद्धिमान अशा गणपतीची लेखनिक म्हणून निवड केली. भूतबाधा, करणी यासारखे वाईट शक्तीचे त्रास गणपतीच्या नामजपाने दूर होऊ शकतात.*
*मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये करवून घेणाऱ्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ति असे म्हटले जाते.*
*गणपतीचा नामजप हा ही प्राणशक्ती वाढवणारा आहे. गणपती हा आपल्या हाकेला लवकर 'ओ' देणारा आहे. तो लवकर प्रसन्न होतो, असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे आपण बोलतो ती नादभाषा गणपती समजू शकतो. अन्य देवता बहुतांशी प्रकाशभाषा समजू शकतात. गणपती ही नादाचे प्रकाशात व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे.*
*सर्वसाधारणपणे जनमानसात असा समज आहे की, सोंडेचे टोक उजवीकडे असणारी मूर्ती म्हणजे उजव्या सोंडेची मूर्ती, व सोंडेचे टोक डावीकडे असणारी मूर्ती म्हणजे डाव्या सोंडेची मूर्ती, परंतु हा समज चुकीचा आहे.*
*सोंडेचे टोक कोणत्या बाजूने वळलेले आहे, त्यावरून कोणत्या सोंडेचा गणपती हे ठरवायचे असते. उदा. सोंडेचे पहिले वळण (स्वतःच्या) डाव्या बाजूला असलेला गणपती डाव्या सोंडेचा गणपती आहे व सोंडेचे पहिले वळण स्वतःच्या उजव्या बाजूने असलेला गणपती हा उजव्या सोंडेचा गणपती आहे.*
*एखाद्या गणेशमूर्तीच्या सोंडेचे पहिले वळण उजवीकडे असून सोंडेचे तोंड /टोक डाव्या बाजूला वळले असले तरी ती मूर्ती उजव्या सोंडेची समजावी. उजव्या सोंडेचा गणपती पूजेत ठेवू नये असा सार्वजनिक समज आहे.*
*काही ठिकाणी हा समज एवढा अतिरेकी आहे की, अशा गणपतीचे पूजन करणे संकटास निमंत्रण देणारे, अथवा अकल्याणकारी समजले जाते. या समाजाचे निराकरण करण्यासाठी त्यामागची शास्त्रीय, आध्यात्मिक बाजू तपासून पाहणे हितकारक ठरते.*
*उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुख मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा ही यमलोकांकडे नेणारी तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे.*
*यमलोकांच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तिशाली असतो, तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही दृष्टींनी उजव्या सोंडेचा गणपती जागृत समजला जातो. दक्षिणेला असलेल्या यमलोकांत पापपुण्याची छाननी होते. म्हणून ती बाजू नकोशी वाटते.*
*जिवंतपणे दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास (अथवा झोपताना दक्षिणेकडे पाय केल्यास) मृत्यूनंतर पापपुण्याची जशी छाननी होते, तशी व्हायला लागते. दक्षिणाभिमुखी मूर्तीची म्हणजेच उजव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे सांभाळून करणे आवश्यक असल्यास ती मूर्ती पूजेत ठेवणाऱ्याने विशेष काळजी घ्यावी लागते.*
*डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती. वाम म्हणजे डावी बाजू उलट दिशा डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे. ती शीतलता देते. तसेच उत्तर दिशा अध्यात्माला पूरक, आनंददायी आहे. म्हणून वाममुखी गणपती पूजेत असावा असे सांगितले जाते. गणपतीचा वर्ण लाल आहे. गणेशपूजेत लाल वस्त्र, लाल फूल व रक्तचंदन वापरतात.*
*त्यांच्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात, व मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. ह कळणे थोडेसे कठीण असल्याने गणपतीला लाल वस्त्र, लाल फूल आवडते, असे थोडक्यात सांगून विषय संपवला जातो.*
*गणेशपूजनात दुर्वांना विशेषस्थान आहे. दूर असलेल्या गणेश पवित्रकांना जवळ आणतात त्या दूर्वा होत. पवित्रक म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म चैतन्यकण. दूर्वा एकत्रित बांधून वाहिल्याने त्याचा सुगंध बराच काळ टिकतो. त्या जास्त वेळ ताज्या राहाव्या म्हणून पाण्यात भिजवून मग वाहतात. या दोन्हीमुळे गणपतीची पवित्रके बराच काळ मूर्तीत राहतात.*
*गणपतीला बहुधा विषम संख्येने (म्हणजे ३, ५, ७, २१) दूर्वा वाहतात. विषम संख्येमुळे भक्ती जास्त प्रमाणात मूर्तीत येते. गणपतीची मूर्ती दूर्वांची मढवून टाकली म्हणजे मूर्तीच्या बाजूला दुर्वांचा वास पसरायला लागतो.*
*गणपतीच्या आकारात संप्रेषित होतो. म्हणून गणपतीच्या पवित्रकांच्या आकारात या आकाराकडे येणे सोपे जाते. यालाच मूर्तीचे समाकारिकत्व ग्रहण केले असे म्हणतात. आलेली पवित्रके निघून न जाण्यासाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. हा गंध असेपर्यंत पवित्रके जास्त प्रमाणात राहातात. तशी ती राहावी म्हणून दिवसातून तीन वेळा दूर्वा बदलतात.*
*गणेशलहरी ज्या दिवशी पृथ्वीवर प्रथम आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला तो दिवस होता माघ शु.चतुर्थी, गणपतीची स्पंदने व पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात. या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हणतात.*
*अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हणतात. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. गणपतीचे पृथ्वीप्रमाणे मंगळवारही आधिपत्य आहे. गणपतीचा व मंगळाचा रंगही एकच आहे. अंगारकीला गणेशस्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात, तसेच मंगळाकडून येणारी गणेशस्पंदनेही पृथ्वीवर येतात. यामुळे चंद्राकडून येणाऱ्या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात.*
*चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणजे मनाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे. साधकाला तर मनोलय करायचा असतो. चंद्रदर्शनाने मनाची चंचलता वाढते. अंगारकीला चंद्राकडील लहरी अधिक प्रमाणात नष्ट होत असल्याने अंगारिका विनायकी व अंगारिका संकष्टी यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी व संकष्टी यांच्याइतके असते.*
*🏵 सर्वप्रथम गणेश का ही पूजन क्यों?*
*हिंदूधर्म में किसी भी शुभकार्यका आरंभ करनेके पूर्व गणेशजीकी पूजा करना आवश्यक माना गया है, क्योंकी उन्हें विघ्नहर्ता व ऋध्दिसिध्दि का स्वामी कहा जाता है। इनके स्मरण, ध्यान, जप, आराधनासे कामनाओंकी पूर्ती होती है, व विघ्नोंका विनाश होता है। वे शीघ्र प्रसन्न होनेवाले बुध्दिके अधिष्ठाता और साक्षात् प्रणवरूप है। गणेश का अर्थ है, गणोंका ईश। अर्थात् गणोंका स्वामी । किसी पूजा, आराधना, अनुष्ठान व कार्य में गणेशजीके गण कोई विघ्न-बाधा न पहुंचाएं, इसलिए सर्वप्रथम गणेशपूजा करके उसकी कृपा प्राप्त की जाती है । प्रत्येक शुभकार्यके पूर्व श्रीगणेशाय नमः का उच्चारण कर उनकी स्तुतिमें यह मंत्र बोला जाता है,*
*वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।*
*अर्थात्, "विशाल आकार और टेढी सूंड वाले करोडों सूर्योंके समान तेज वाले हे देव, (गणेनजी), मेरे समस्त कार्योंको सदा विघ्नरहित (सम्पन्न) करे ।*
*वेदोंमेभी गणेशजीकी महत्ता व उनके विघ्नहर्ता स्वरूपकी ब्रम्हरूपमें स्तुति व आवाहन करते हुए कहा गया है,*
*गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कबीना मुपश्रवस्तमम् । ज्येष्ठराजं ब्रम्हणां ब्रम्हणस्पत आ नः श्रूण्वन्न् तिभिः सीदसादनम् ।।*
*अर्थात्, "तुम देवगणोंके प्रभु होनेसे गणपति हो, ज्ञानियोमें श्रेष्ठ हो, उत्कृष्ट रीतिवालोंमें श्रेष्ठ हो । तुम शिवके ज्येष्ठ पुत्र हो, अतः हम आदरसे तुम्हारा आवाहन करते है । हे ब्रम्हणस्पते गणेश, तुम अपनी समस्त शक्तियोंके साथ इस आसन पर आओ ।"*
*दुसरे मंत्र में कहा गया है,*
*नि षु सीद गणपते गणेषु त्वामाहुर्विप्रतमं कवीनाम् । न ऋते त्वत् क्रियते किं चनारे महापर्कं मघवार्कं मघवंचित्रमर्च ।।*
*अर्थात्, "हे गणपते! आप देव आदि समूहमें विराजिए, क्योंकी समस्त बुध्दिमानोंमें आप ही श्रेष्ठ हैं । आपके बिना समीप या दूर का कोईभी कार्य नहीं किया जा सकता । हे पूज्य आदरणीय गणपते! हमारे सत्कार्योंको निर्विघ्न पूर्ण करनेकी कृपा कीजिए ।"*
*गणेशजी विद्या के देवता है। साधनामें उच्चस्तरीय दूरदर्शिता आ जाए, उचित-अनुचित, कर्तव्य-अकर्तव्यकी पहचान हो जाए, इसलिए सभी शुभकार्योमें गणेशपूजनका विधान बनाया गया है ।*
*गणेशजीकी पूजा सबसे पहले क्यों होती है, ईसकी पौराणिक कथा इस प्रकार है,*
*पद्मपुराण के अनुसार - स्रूष्टीके आरंभमें जब यह प्रश्न उठा कि, प्रथमपूज्य किसे माना जाए, तो समस्त देवतागण ब्रम्हाजीके पास पहुंचे । ब्रम्हाजीने कहा की, जो कोई संपूर्ण पृथ्वीकी परिक्रमा सबसे पहले कर लेगा, उसेही प्रथम पूजा जाएगा। इसपर सभी देवतागण अपने अपने वाहनोंपर सवार होकर परिक्रमा हेतु चलपडे। चूंकि गणेशजीका वाहन चूहा है, ओर उनका शरीर स्थूल, तो ऐसेमे वे परिक्रमा कैसे कर पाते? इस समस्या को सुलझाया देवर्षि नारदने। नारदने उन्हें जो उपाय सुझाया, उसके अनुसार गणेशजीने भूमिपर "राम" नाम लिखकर उसकी सात परिक्रमा की, और ब्रम्हजीके पास सबसे पहले पहुंच गए। तब ब्रम्हाजीने उन्हें प्रथमपूज्य बताया। क्योंकी "राम" नाम साक्षात् श्रीरामका स्वरूप है, और श्रीराममें ही संपूर्ण ब्रम्हांड निहित है।*
*शिवपुराणकी एक अन्य कथा के अनुसार एक बार समस्त देवता भगवान शंकरके पास समस्या लेकर पहुंचे की, किस देव को उनका मुखिया चुना जाए। भगवान शिवने यह प्रस्ताव रखा कि, जो भी पहले पृथ्वीकी तीन बार परिक्रमा करके कैलास लौटेगा, वही अग्रपूजाके योग्य होगा, और उसेही देवताओंका स्वामी बनाया जाएगा। चूंकि गणेशजी का वाहन चुहा अत्यंत धीमी गतिसे चलनेवाला था, इसलिए अपनी बुध्दिचातुर्यके कारण उन्होंने अपने पिता शिव और माता पार्वतीकी ही तीन परिक्रमा पूर्ण की, और हाथ जोडकर खडे होगए। शिवने प्रसन्न होकर कहा की, तुमसे बढकर संसारमें अन्य कोई इतना चतुर नहीं है। माता-पिताकी परिक्रमासे तीनों लोकोंकी परिक्रमा का पुण्य तुम्हे मिलगया, जो पृथ्वीकी परिक्रमासे भी बडा है। इसलिए जो मनुष्य किसी कार्यके शुभारंभसे पहले तुम्हारा पूजन करेगा, उसे कोई बाधा नही आएगी। बस, तभीसे गणेशजी अग्रपूज्य हो गए।*
श्री गणेश पुराण कथा (क)*
*भीमराजाची कथा*
महान तपस्वी व्यासांना ब्रह्मदेवांनी गणेश महात्म्य संबंधी आणखी एक रसाळ कथा सांगण्यास प्रारंभ केला.
भीम राजा विदर्भ देशातील कौण्डिन्य नगरात राहात होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती, सत्ता,ऐश्वर्य होते. भीम राजा मोठा पराक्रमी व दानशूर होता. प्रजादक्ष होता. अशा भीम राजास एक सात्विक, पतिव्रता प्रियतमा होती. तिचे नाव होते चारुहासिनी. तिला कशाचीही कमतरता नव्हती. पण मूलबाळ नसल्याने ती दुःखी असे. आपल्या अर्धांगिनीला झालेले दुःख राजास सहन होत नसे. एके दिवशी राजा आणि राणी एकांतात बसले होते. भीम राजा म्हणाला, “हे प्रिये, आपल्या विवाहास खूप वर्ष झाली. पण अजून सुद्धा पुत्रसंतती झाली नाही. त्यामुळे आपण राज्यत्याग करून, देवाची तपश्चर्या करण्यासाठी घनदाट अरण्यात जाऊ. त्यातच आपले हित आहे.”
त्यानंतर भीम राजांनी दोन विश्वासू प्रधानांना बोलवले. त्या दोन प्रधानांची नावे मनोरंजन व सुमंत अशी होती. त्यांना भीम राजा म्हणाला, “आम्ही दुःखी होऊन ह्या राज्याचा त्याग करुन वनात तपश्चर्या करण्यासाठी जात आहोत. तेथून आमचे पुन्हा येथे आगमन झाले नाही तर दोघांमध्ये अर्धे अर्धे राज्य वाटून घ्या व सुव्यवस्थित राज्यकारभार चालवा. प्रजेची काळजी घ्या.” नंतर भीम राजाने सपत्नीक अरण्याकडे प्रस्थान केले. ते दोघेही घनदाट अरण्यात आले. त्यांना तेथे एक निसर्गरम्य आश्रम दिसला. तो आश्रम महान तपस्वी विश्वामित्र ऋषींचा होता. तेथे विश्वमित्र दर्भासनावर शांतपणे बसले होते. ते दोघेही त्या आश्रमात गेले. आश्रमात आल्यानंतर भीम राजा व राणीने त्यांना वंदन केले. आपल्या दिव्य ज्ञानाने राजाचे आगमन येथे कशासाठी झाले आहे हे त्यांनी ओळखले.
विश्वमित्र ऋषी म्हणाले, “तुला सर्व सुखांची प्राप्त होईल, तुझ्या पोटी सद्गुणी, सात्विक, कीर्तीमान पुत्र जन्म घेईल. तू शिवपार्वती सुताचे म्हणजेच श्री गणेशाचे पूजन करण्यास सुरुवात कर. त्या गणेशास सर्व गोष्टीचे ज्ञान आहे. तुझे कुलदैवत मंगलमूर्ती श्री गणेश असताना सुद्धा संपत्तीच्या अहंकारामुळे तू त्याचे पूजन केले नाहीस. तेहतीसकोटी देवदेवतांमध्ये गणेशास अग्रपूजेचा मान मिळाला आहे. त्याचे स्मरण न केल्यामुळे सर्व देवदेवता तुझ्यावर असंतुष्ट आहेत. त्यामुळे तू निपुत्रिक आहेस. गजाननाच्या कृपेमुळे तुला नक्कीच संतान प्राप्ती होईल. तो आपल्या भक्तांची कामना पूर्ण करतो. आता तुला तुझ्या पूर्वजांचे चरित्र सांगतो, ते नीट ऐक.”
तुझ्या सातव्या पूर्वजांचे नाव होते भीम. तो सुद्धा पराक्रमी राजा होता. त्याच्या अर्धांगिनीचे नाव होते कमला. या दांपत्यास अनेक वर्षानंतर संतानप्राप्ती झाली. तो मुलगा जन्मताच मुका व बहिरा होता. त्याच्या पाठीला कुबड होते. सर्वांगाला क्षते पडली होती. सर्वांगाला दुर्गंधी येत होती. यामुळे महाराणीस रडू कोसळले. आता आपणच मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे राजास वाटले. राजाने काही विद्वान ज्योतिषांना या राजपुत्राचे नाव काय ठेवू असा प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, “राजन राजपुत्रास जन्मताच व्यंग आहे. त्याची जन्मभर दक्षता घ्यावी लागेल. त्यामुळे तू त्यांचे नाव दक्ष असे ठेव.” नामकरण समारंभानंतर आपल्या पुत्रासाठी राजाने अनेक मंत्र, तंत्र, देशी-विदेशी औषधे उपाय करून पाहिला. पण सर्व परिश्रम वाया गेले. त्यामुळे राजाने एक तप तपश्चर्या केली. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.
राजाच्या मनावरचा संयम गेला. तो चिडक्या स्वभावाचा झाला. एक दिवस रागाच्या भरात आपल्या प्रियतमेस म्हणाला, “तू व तुझा मुलगा येथून ताबडतोब जा. मला तुम्हा माय लेकाचे तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही.” असे बोलून राजाने त्या दोघांना घरातून हाकलून दिले. आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन कमला राणी गावोगावी फिरून भिक्षा मागून पोट भरत असे. ती भिक्षा मागण्यासाठी जाताना मुलाला मंदिरातच ठेवत असे. एकदा अशीच ती भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेली असता, तेथे एक महान भगवद् भक्त आला. तो ब्राह्मण होता. त्याच्या नजरेस ते मूल दिसले. त्याची दया येऊन ब्राह्मणाने ते उचलेले. ब्राह्मणाच्या शरीरावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने त्या व्यंग मुलाचे सर्वांग व्यवस्थित झाले. तो सामान्य मुला सारखा दिसू लागला. कुरूप मुलाचे गोंडस, मनमोहक मुलामध्ये रूपांतर झाले. त्याच्या अंगावरील सर्व क्षते नाहीशी झाली.
कमला राणी भिक्षा मागून परत आल्यानंतर तिला फार आनंद झाला. हे आपले मुल सुंदर कसे काय झाले ते तिला कळेना. तिने देवाचे आभार मानले. त्यानंतर काही वर्षानंतर देवास आपण प्रसन्न करून घ्यावे असे राजपुत्रास वाटले. दक्ष मनात म्हणाला, ‘तेहतीस कोटी देव देवता असून सुद्धा, श्री गणेशास अग्रपूजेचा मान आहे. तेव्हा मंगलमूर्तीलाच आपण प्रसन्न करून घेऊ या. तोच आपली मनोकामना पूर्ण करेल.’ दक्षाने श्रीगणेश उपासनेस प्रारंभ केला. प्रथम ॐ गं गणपतये नमः असा अष्टाक्षरी मंत्र जपण्यास सुरुवात केली. श्री गणेश त्याला प्रसन्न झाले. तेव्हा दक्षास गणपतीचे मनोहर रूप दिसले. एका क्षणातच गणपतीने ब्राह्मणाचे रूप घेतले व म्हणाले, “मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी या लहान वयात बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे.”
यावर राजपुत्र दक्ष म्हणाला, “हे शिवपार्वती सुता, गजानना, आता साक्षात तुझे दर्शन झाल्यामुळे मी आनंदी आहे. मी आता तुमच्याकडे वर मागतो.” त्यामुळे गजाननाने आपले पूर्वरूप धारण केले व म्हणाले, “बाळा, मी तुला वर देत नाही. कारण तो अधिकार माझा लाडका भक्त मुद्गल याचा आहे. त्याच्याच दिव्यस्पर्शामुळे तुझे शरीर सर्वांगसुंदर झाले. तू त्याच्या आश्रमात जाऊन भेट घे. तो नक्कीच तुला वर देईल.” असे सांगितल्यावर गणपती अंतर्धान पावले. हे पाहून दक्षाला रडू कोसळले. गजानन अंतर्धान पावल्यानंतर सर्वकाही त्याग करून दक्ष श्रीगणेशाच्या शोधासाठी बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याची माता पण होती. अशाप्रकारे भटकंती करत सुदैवाने राजकुमार दक्ष मुद्गल ऋषीच्या आश्रमात गेला.
भक्तिमय वातावरण पाहून दक्षास परमानंद झाला. आश्रमात व्याघ्र आसनावर मुद्गल ऋषी बसले होते. त्यांच्या समोर श्रीगणेशाची एक मनमोहक मूर्ती होती. ते भक्तीयुक्त अंतःकरणाने श्रीगणेशाची पूजा करत होते. दक्षाने त्यांना नमन केले. दक्ष म्हणाला, “मुनीवर, आपले उपकार मी कधीही विसरणार नाही. तुमच्या मुळेच माझे कुरूप शरीर सुंदर झाले. श्री गजाननाने मला दोन रूपाचे दर्शन घडविले. त्यांनी मला सांगितले की आपण मला वरदान द्याल , म्हणून मी येथे आलो आहे.” राजपुत्राचे हे बोलणे ऐकल्यानंतर मुद्गल ऋषी म्हणाले, “दक्ष, तु खरोखर भाग्यवान आहेस. साक्षात श्री गजाननाने तुला द्वी रूप दाखवले. म्हणजे भक्तीत तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मी गेल्या हजार वर्षापासून गणपतीच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत आहे, तरीसुद्धा तो माझ्यावर असंतुष्ट आहे.” असे बोलून मुद्गल ऋषिंनी दक्षास मिठी मारली.
त्यांनी राजपुत्रास एका दिव्य मंत्राचा उपदेश केला. तो दिव्य मंत्र म्हणजे एकाक्षर मंत्र होय. ऋषी म्हणाले, “तू नित्यनेमाने, भक्तिमय अंतकरणाने या एकाक्षर मंत्राचा निष्ठापूर्वक जप करत जा. यामुळे श्री विनायक तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.”
*श्री गणेश पुराण कथा (ड)*
*बल्लाळ विनायकाची कथा*
सोमकांत राजाने आदरणीय भृगु ऋषींना प्रश्न विचारला, “ऋषी महाराज, स्वतः मुद्गल ऋषी एवढे तपस्वी असून सुद्धा त्यांच्यावर गजानन प्रसन्न का झाला नाही? दक्षाने ऋषीएवढी तपश्चर्या केली नव्हती तरी त्याला गजानन प्रसन्न कसा झाला? भृगु ऋषी म्हणाले, “मी तुला दक्ष राजपुत्राची पूर्वजन्माची सर्व हकीकत सांगतो.”
सिंधू नावाचा एक देश होता. त्या देशात एक गाव होते. त्या गावाचे नाव होते पल्ली. या गावात फार वर्षापूर्वी एक वाणी राहत होता. त्याचे मोठे किराणा मालाचे दुकान होते. या वाण्याचे नाव होते कल्याण. तो नावाप्रमाणेच दुसऱ्याचे कल्याण करीत असे. तो रोज लक्ष्मीची पूजा करत असे. त्याला सात्विक पत्नी लाभली होती, तिचे नाव होते इंदुमती. अशा या दांपत्यास देवाच्या कृपेमुळे सुपुत्र लाभला. त्यांनी त्याचे नाव ठेवले बल्लाळ. बल्लाळला लहानपणापासून खेळण्यात मुळीच रस नव्हता. त्याला देवपूजा करण्यास फार आवडत असे. एके दिवशी बल्लाळाच्या मनात वेगळाच बेत होता. त्याने एक गोटा घेतला व त्याला गणपती असे सर्वांच्या साक्षीने नाव दिले. त्याला फुलांचा हार घातला व दुर्वाची जुडी वाहिली. नंतर सर्व बालसेनेने मिळून श्रीगणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली.
बल्लाळाच्या काही मित्रांच्या जन्मदात्यांना हा प्रकार आवडला नाही. ते बल्लाळाच्या वडिलांना त्याबद्दल बोलले. गावातल्या लोकांचे हे बोलणे ऐकल्यावर कल्याण अत्यंत संतापला. वेताची काठी घेऊन तो गावाबाहेर गेला. कल्याणाने कसलाही विचार न करता काटक्यांचे देऊळ, मंडप वगैरे सर्व काही दूरवर फेकून दिले. बल्लाळ तिथे शांत चित्ताने नेत्रकमले बंद करून श्री गजाननाचे ध्यान करीत होता. कल्याणने त्याला पकडले व छडीने त्याला यथेच्छ बडवून काढले. त्यानंतर एका झाडाला उलटे लटकावून ठेवले.हा सर्व प्रकार झाल्यानंतर कल्याण घरी निघून गेला. त्याने इंदुमतीला सर्व हकिकत सांगितली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
इकडे बल्लाळने श्रीगणेशाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. “समुद्रमंथनाच्या वेळी हालाहल विष शंकराने प्राशन केले त्या नीलकंठाचा व पतिव्रता पार्वतीचा तुम्ही सुपुत्र आहात. तुम्हाला प्रथम कोटी कोटी प्रणाम. आता माझ्यावर जे संकट आले आहे, त्याचे तुम्हीच निवारण करा. मी तुमच्या दिव्य दर्शनासाठी आतुर झालो आहे.” आपल्या पिताश्रींनी श्रीगजाननाचे देऊळ मोडून टाकले, हे लक्षात आल्यानंतर बल्लाळ रागावला व त्याने साक्षात् जन्मदात्याला शाप दिला, ‘माझ्या जीवाचे जीवन असणारे श्री गजाननाचे मंदिर ज्याने फेकून दिले, तो दृष्टिहीन होईल, तसेच बहिरा, मुका व कुबडा होईल. त्याच्या शरीरास दुर्धर रोग होऊन सर्वांगास दुर्गंध सुटेल. हे देवा श्रीगणेशा मी जर तुझी भक्तीमय अंतकरणाने पूजा केली असेल तर हा शाप खरा होऊ द्या.’
बल्लाळाच्या भक्तीवर श्रीगजानन प्रसन्न झाले. त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात बल्लाळास दर्शन दिले. श्रीगणेशाने बल्लाळला बंधनातून मुक्त केले. बल्लाळाने श्रीगणेशाला साष्टांग नमस्कार घातला व गणपती स्तोत्राच्या पठणास प्रारंभ केला. श्री गणेशाच्या कृपादृष्टीने बल्लाळाच्या सर्व जखमा बऱ्या झाल्या. त्याचे शरीर पूर्ववत झाले. लंबोदराने त्याला जवळ बोलावले व म्हणाले, “एवढ्याशा वयात तुझी गणेश भक्ती पाहून मी धन्य झालो. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तू दिलेला शाप खरा होईल. पुढील जन्मात त्याला त्याचे वडील घराबाहेर हाकलून देतील.”
बल्लाळ म्हणाला, “तुमचे दिव्य रूप माझ्या हृदयात राहू द्या व मुखामध्ये सदैव तुमचे नामस्मरण असू द्या. तुम्ही आता इथेच राहून लोकांवर प्रेमाचा वर्षाव करा. त्यांच्या प्रापंचिक अडचणी दूर करा.” गणपती म्हणाले, “जशी तुझी इच्छा! तू मला इथे राहण्यासाठी सस्नेह आमंत्रण दिले, त्यामुळे माझ्या आधी लोक तुझे नाव घेतील. मी बल्लाळविनायक या नामरूपाने प्रसिद्ध होईल. अनेक गणेशभक्त माझ्या दर्शनासाठी येतील.”
बल्लाळाने दिलेला शाप खरा झाला. त्या कल्याण वाण्याचे सर्व अंग बधीर झाले. त्याची वाचा गेली. तो दृष्टिहीन झाला. त्याला काही ऐकू येईना. त्याच्या शरीरात दुर्धर रोग झाला. इंदुमती ने मात्र त्यांची साथ सोडली नाही. इंदुमती आपल्या मैत्रिणींसह बल्लाळाला आणण्यासाठी गावाबाहेर आणण्यात गेली. तेथे गेली तर तिला वेगळेच दिसले. तिथे एक श्री गजाननाचे सुंदर मंदिर होते. बल्लाळ श्रीगणेशाची पूजा करत बसला होता. तिने धावत जाऊन आपल्या सोनुल्यास मिठी मारली व म्हणाली, “आता तू घरी चल. तुझे वडील फार आजारी आहेत. तू दिलेल्या शापामुळे हे सर्व झाले आहे. त्यामुळे तूच आता पिताश्री साठी काहीतरी उपाय शोधून काढ.” बल्लाळ म्हणाला, “पिताश्रींच्या हातून महापाप झाले. त्यामुळेच मी त्यांना शाप दिला. मला आता सर्व गोष्टींचे ज्ञान झाले आहे. त्यामुळे मी घरी येणार नाही. माझे जीवन श्रीगजाननाच्या चरणी अर्पण करणार आहे. त्यामुळे तू आता घरी जाऊन पती परमेश्वराची सेवा कर. तू सुद्धा गजाननाची भक्ती कर.”
इंदुमती म्हणाली, “याच्यासाठीच आम्ही तुला जन्म दिला का? तू शाप देताना थोडा तरी विचार करायला हवा होतास. आपल्या पिताश्रींना शाप दिल्यामुळे तुझे पुण्य नक्कीच क्षीण झाले आहे. वृद्धापकाळी आधार असावा म्हणून आई-वडील मुलांना जन्म देतात. पिताश्रीमुळे तुला हे निसर्गरम्य जग पाहायला मिळाले. तेव्हा त्यांच्या उपकारांची परतफेड कर. बल्लाळ म्हणाला, “मला क्षमा कर माते. मी चुकलो. मी तेथे येऊन सुद्धा उपयोग नाही. पुढील जन्मी त्यांचे कल्याण होईल. त्यांना राजकुळात जन्म मिळेल. त्यावेळी तुझे नाव कमला असेल. तुम्हाला भविष्यकाळात श्री गजाननाचे दर्शन नक्की होईल. त्याची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील.” ती भविष्यवाणी ऐकून इंदूमती घरी आली. बल्लाळाला आणण्यासाठी श्रीगणेशाने खास दिव्य विमान पाठवले. त्या विमानात बसून बल्लाळाने स्वर्गलोकी प्रस्थान केले.
*श्रीगणेश*
भाग -५.
सर्व शास्रांमधे श्रीगणेशाला सर्व देवांपेक्षा महत्वाचं स्थान आहे. श्रीगजाननाची अाराधना म्हणजेच सर्व देवांची आराधना केल्याचं फळ मिळते, कारण ब्रम्हा, विष्णु, महेश तीन मुख्य देव! पैकी ब्रम्हा सृष्टीचे निर्माते, विष्णु पालनकर्ते तर महेश संहारकर्ते. विश्वाचा मित्र व सहाययक सूर्य, कर्म घडविणारी मोहरुपी आदीशक्ती मनाचं नियंत्रण करणारी... हे पांचही ब्रम्हरुप ईश्वर म्हणजे "गण" या गणाचा पती म्हणजेच नेता.. गणपती!
निर्माता, संहार व पालन करणारा, कर्म घडविणारा, मनावर नियंत्रंण ठेवणारा गजानन म्हणुन तो पुर्णब्रम्ह व सर्वश्रेष्ठ आहे.
शंकराचं कैलास, इंद्राचा स्वर्ग, काशी व इतर क्षेत्रांचा नाश होऊ शकतो परंतु श्रीमयुरेश्वरक्षेत्र अविनाशी आहे. हे क्षेत्र पृथ्वीवर असुनसुध्दा स्वर्गापेक्षा जास्त पवित्र व शक्तीशाली आहे. स्वतःची निर्मिती स्वतः करण्याची शक्ती असलेलं सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेवाहुन मयुरेशक्षेत्र श्रेष्ठ असल्याचं अनेक वेदांनी व शास्रांनी सिध्द केलं आहे.
विश्वविलासिनी महामाया, जी सत्तेची मालकीन या अविनाशी क्षेत्रापासुन दूर होताच तिच्या हातून सत्ता गेली. विश्व सृष्टी निर्माण करायहा सत्ता मिळावी म्हणुन तिनं ध्यान करुन तपश्चर्या केली. तिच्या त्या तद्रुप भूमिकेलाच भूस्वानंदक्षेत्र ही संज्ञा प्राप्त झाली, तेच हे भूस्वानंद म्हणजेच मयुरेश्वरक्षेत्र. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न् होऊन ऐश्वर्यसंपन्न होशील असा गणेशाने "वर" दिला.
महाशक्ती असणारी सुखकर्ता, दुःखहर्ता गणेशाने भक्तांना दर्शन देण्याकरितां, त्यांना कार्य करण्याची स्फुर्ती व कार्यात यश देणारी सिध्दी मिळावी, स्वमहिमारुप, स्वयंज्योतिर्गमय, साक्षात सयंवेदब्रम्ह, स्वस्वानंद, मायाधिष्ठानरुप, स्वानंदब्रम्ह जे मयुरेश्र्वर या पवित्र जागु भक्तांच्या रक्षणासाठी येऊन राहिले
भूत्वानंद क्षेत्ररुप ठरलेली भूलोकावरील सर्वात जास्त आनंद देणारी व सृष्टीवर नियंत्रण ठेवणारी जागा म्हणजेच मोरगावचे मयुरेश्वरक्षेत्र!
वेदामधे शक्ती, सूर्य, विष्णु व शिव या चार उपासना करणार्या देवतांचा निवास भूस्वानंद क्षेत्राच्या चारही दाराजवळ आहेत. श्रीमयुरेश्वर क्षेत्राच्या चार दिशांना जी चार दारं आहेत त्याच्या ह्या देवता आहेत. साक्षात आत्मस्वरुप परब्रम्ह, ब्रम्हणस्पती म्हणजेच गणेश हा त्यांचा नायक!
ऋग्वेदामधे " मंद्रेरिंद्रहरी भिः या मंत्रामधे ही माहिती असुन ती प्रमाणसिध्द आहे. साक्षात्स्वसंवेद्यस्वरुप, स्वानंद महिमा, साक्षात्किरण ब्रम्हरुप असा हा स्वानंदलोक, त्याचेच प्रतिबिंब म्हणजेच श्रीभूस्वानंक्षेत्र किंवा मयुरक्षेत्र होय.
काही काळाने भाविकांच्या पातकामुळे देवतांना मालिन्य येऊ लागल्याने, स्वतःचे निर्मल्यत्व अक्षय रहावं म्हणुन गणेशाची प्रार्थना करुन मोरेगांव येथील मयुरेशक्षेत्री राहण्याची परवाणगी देवतांनी मागीतली. मयुरेश्वरक्षेत्री वास्तव्य झाल्याने सर्व देवतांचे पावित्र्य कायम राहिले. विश्वामधे काशी प्रयागादी क्षेत्रे प्रसिध्द आहेतच, ती सर्व मूलस्वरुपाने व पुर्णसामर्थ्याने मयुरेशक्षेत्री आहेत.
पंचेश्वराची उत्पत्ती झाल्यानंतर सामर्थ्यप्राप्तीसाठी पांच देवांनी आत्मस्वरुपाचे ध्यान करुन तपश्चर्या केल्याने ते गजाननाशी एकरुप झाले. ब्राम्हणस्पती स्वरुप गणेशाचा साक्षात्कार त्यांच्या ह्रदयात प्रगट झाला.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
*श्रीगणेश*
भाग--६.
पंचदेवांना ध्यानस्थितीत गणेशाचे जे दर्शन झाले ते प्रत्यक्षात घडावं अशी प्रार्थना केली, तेव्हा आकाशवाणी झाली की, गुरुच्या सानिध्यात गेल्याशिवाय योग्य ज्ञान व दर्शन होऊ शकत नाही. तरी भक्तश्रेष्ठ श्रीभ्रुशुंडीयोगांद्राच्या अमलाश्रमात जाऊन त्याला शरण जा.
पंचदेव अमलाश्रमांत श्रीभ्रुशुंडीचे दर्शन घेतल्यावर त्यांना समग्र गणेशज्ञान देऊन म्हणाले, "पंचदेव हो! जीथे आत्मस्वरुपाचं ध्यान केले त्यावेळी देवबलाने साक्षात्कार होऊन श्रीगणेशाचं दर्शन झाल तिथे परत जाऊन ध्यानात दिसलेल्या मूर्तीची स्धापना केल्यास गजाननाचं दर्शन होऊन कृतार्थ व्हाल."
वेदांनी सांगीतलेल्या भूस्वानंद अर्थात मयुरेशक्षेत्री मोरगांवला मुख्याधिष्ठान स्थळी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पंचेश्वरांनी गजाननाची मुर्तीप्रतिष्ठा केली. पांच महिण्याने माघ शुक्ल चतुर्थीला मयुरावर विराजमान असलेल्या गणेशाने प्रसन्न होऊन पंचश्वरांना सृष्टी व सत्ता दिली, माया म्हणजे मयुरा, तिच्यावर नियंत्रण ठेवणारा तो मयूरेश! पुढे या जागेला मोरगाव आणि मोरगांवचे क्षेत्राधिपती श्रीगजानन यांना मयूरेश नांव पडले.
मयूरेशक्षेत्राचे महात्म्य अमोघ, परिणामी, अतुल व फलदायी आहे. या विषयी एक कथा प्रसिध्द आहे. सुप्रतिक नांवाचा एक तरुण तिर्थयात्रेच्या निमित्ताने यात्रेकरुमधे मिसळुन त्यांना लुबाडणे, त्यांचा घात, खुण, दरोडे ही सर्व पापे तो करीत असे. एकदा चोरी करण्याच्या उद्देशाने यात्रेकरु मंडळीबरोबर पुराण कथा ऐकायला बसला असतां त्यावेळी स्कंद पुराणातील मयुरेशक्षेत्राचे महात्म्य सांगीतल्या जात होते. मयुरेशक्षेत्राच्या वर्णनात एवढी शक्ती आहे की, सुप्रतिकाच्या अंतःकरणात एकाएकी बदल झाला. त्याचा एकदम कायापलट झाला. पुराणिकांनी त्याला या क्षेत्राचं महात्म्य ऐकवल. आणि काय आश्चर्य! ज्याच्या ठीकाणी थोडीसुध्दा पुण्यबुध्दी उत्पन्न होण्याचा संभव नव्हता, त्या सुप्रतिकाने पश्चातापदग्ध होऊन मयुरेशक्षेत्री कायमचा आश्रय घेतला.
श्रीभ्रूशुंडीमहाराज व पंचदेव यांचा संवाद सुरु असतांना पंचदेवांनी विचारले, "इतर क्षेत्र विनाशी तर मग मोरेश्वरक्षेत्रच अविनाशी कसे?" गणेश जो स्वानंद, पुर्णब्रम्ह्य स्वरुप, त्याने स्वतःकरितां निर्माण केलेले असल्यामुळे हे मयुरेशक्षेत्र अविनाशी आहे. इथुनच इतर क्षेत्र व ब्रम्हाडांची निर्मिती झाली. याचा विनाश झाला तर सृष्टी पुनः निर्माण होणारच नाही. याच क्षेत्री योगिंद्रमहाराजांनी गणेशविजय नांवाचा ग्रंथ लिहिला.
गणेशाच्या निःश्वासापासुन उत्पन्न झालेले आदिगुरुस्वरुप असे वेद, गणेशाच्या आज्ञेवरुन पांच देवांना देण्यास सांगीतले असतां त्यांना दिव्यदृष्टी देऊन ब्रम्हसत्ता ज्योतीस्वरुप असे श्रीमयुरेश क्षेत्र दाखविले.
श्रीमयुरेश क्षेत्राचं साक्षात ब्रम्हस्वरुप वेदात व गणेशविजय ग्रथांत सुध्दा सांगीतले आहे. हे क्षेत्र सार्वभौमस्वरुपाचे, स्वयंभू व समर्थ क्षेत्र आहे. सर्व क्षेत्रांचे, सत्तेचे, क्षेत्रप्रकाशाचे मुळ हेच असुन ब्रम्हा विष्णु, शिव शक्ती सुर्यादी पंचेश्वरांनीही श्रेष्ठ मानले. श्रीमौदगल पुराणाच्या सहाव्या खंडात श्रीगणेशाने प्रसन्न होऊन समग्र क्षेत्रदेवतांना वरदान दिल्याचा उल्लेख आहे.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय ८ वा*
मच्छिंद्रनाथ बज्जेश्वरी सोडून पुढे उत्तरेकडे गेले. द्वारकेला जाऊन त्यांनी गोमती नदीत स्नान केले. नंतर ते शरयू नदीतीरी अयोध्या नगरीला गेले. तेथे रामबंशातील पाशुपत नावाचा राजा होता, तो रामाच्या देवालयात पूजेसाठी गेला होता. त्याच्याबरोबर फार मोठे सैन्य होते. देवालयातही अपरंपार गर्दी होती. मच्छिंद्रनाथही त्याच वेळी दर्शनासाठी देवालयात शिरत होते. तेव्हा तेथील द्वारपालांनी त्याला अडविले व म्हटले, "ए मुर्खा ! कानफाट्या, मागे हो, चाललास कुठे? राजेसाहेब दर्शनाला आले आहेत. दिसत नाही का? मागे हट." असे ओरडून मच्छिंद्राला त्यांनी मागे ढकलून दिले. मच्छिंद्रनाथाने राग आवरला. चाकरांवर क्रोध करणे योग्य नव्हे; ते बिचारे धन्याच्या स्वाधीन. बरे, राजाला शिक्षा करावी तर तो लाखांचा पोशिंदा. त्याची हानी म्हणजे सर्व प्रजेची हानी. म्हणून राजालाही कठोर शिक्षा करून चालणार नाही, असा विचार करून मच्छिंद्रनाथ मंदिराबाहेरच्या गर्दीत थांबले.
देवालयात राजा राममुर्तीसमोर साष्टांग नमस्कार घालीत होता. मच्छिंद्राने गुप्तपणे भस्मावर स्पर्शास्त्र मंत्रून त्याच्या दिशेने ते टाकले. राजाबर त्याचा असा प्रभाव पडला की तो दंडवत घालून जो पडला होता, तो भूमीला चिकटूनच राहिला. रामाच्या मुर्तीसमोर राजा पडलेला; त्याला उठताच येईना. सगळे लोक पहात राहिले. सर्वच गोंधळ झाला. कोणातरी योग्याचा अपमान झाला असणार, म्हणूनच राजाची अशी अवस्था झाली, असे सर्व बोलू लागले व सर्वत्र शोध घेऊ लागले. द्वारपालांकडून मच्छिंद्रनाथाचा शोध लागला. मग मंत्री येऊन त्याच्या पाया पडले व काकुळतीला येऊन त्याला बिनवू लागले. त्यांची दया येऊन मग नाथाने विभक्त मंत्र जपून राजाला सोडविले. राजा उठला. तोही नाथाला शरण आला. मच्छिंद्रनाथाचे नाव कळताच तो आनंदाने गहिवरला. त्याने आधीच मच्छिंद्रनाथाची कीर्ती ऐकली होती. तेव्हा प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने मोठ्या सन्मानाने मच्छिंद्रनाथाला राजवाड्यात नेले आणि त्यांचा मोठा सत्कार केला.
राजाने मच्छिंद्रनाथाची सेवा इतकी मनोभावे केली की, त्याच्या वर मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाला. तो म्हणाला, "राजा, तुझी काय इच्छा आहे ती सांग, मी पुर्ण करीन." तेव्हा राजा हात जोडून म्हणाला, "महाराज, मी रामचंद्राच्या वंशातला आहे. मला त्यांचे दर्शन होईल तर मी स्वतःला फार धन्य समजेन." मच्छिंद्रनाथाने राजाचे म्हणणे मान्य करून राजाला सभागृहाच्या बाहेर मोकळ्या पटांगणात नेऊन आपले अमोघ ॐ अख म्हणजे वाताकर्षण अख काढले. भस्माची चिमूट मंत्र म्हणून त्याने सूर्यावर फेकली. त्यामुळे रथाचा आधार असे जे वायुचक्र ते आकृष्ट झाले व सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याचे तेज इतके दाहक झाले की पृथ्वीवर सगळीकडे अग्नी भडकला व सृष्टी जळू लागली. ते पाहून मच्छिंद्रनाथाने ॐ जलदास्त्राचा प्रयोग करून तो भयंकर अग्नी शांत केला. सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्रामुळे अश्व-अरूणांसह निश्चेष्ट पडला होता. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेजही क्षीण झाले व त्यांचे मुख्य ब्रह्मा, विष्णू व शंकर हे पृथ्वीवर आले. मच्छिंद्र सर्वांचा आवडता होता; पण त्याने सूर्याची अशी बाईट स्थिती केल्यामुळे ते दुःखी झाले. त्यातले भगवान विष्णू मच्छिंद्राला म्हणाले, "मच्छिंद्रा! या जगमित्र सूर्यावर तू अन्यायाने हे अस्त्र का उपयोगात आणलेस?" मच्छिंद्रनाथाने उत्तर दिले, "हा पाशुपतराजा सूर्य वंशातला आहे. सूर्याने कधीतरी या आपल्या वंशजाची साधी इच्छा तरी पुर्ण केली आहे का?"
विष्णू म्हणाला, "मग तुझी काय इच्छा आहे?" मच्छिद्रनाथ म्हणाला, "पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे. रामदर्शन करण्याची त्याची इच्छा आहे, ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे आणि माझ्या शाबरी विद्येत आपण स्वतः नाममंत्राच्या ठायी राहून सिध्दी दिली पाहिजे?" विष्णू म्हणाले, "तुझे हे काम करण्याचे सूर्य मान्य करील. तू त्याला आधी सावध कर." मच्छिंद्रनाथ म्हणाला, "कृपाकरून आधी या राजाला रामप्रभूचे दर्शन घडवा. मगच सूर्याला सोडीन." त्यांचे हे बोलणे झाले न झाले तोच स्वतः रामचंद्र व लक्ष्मण प्रगट झाले. त्यांचे दर्शन होताच शंकरांना अत्यंत आनंद वाटला. पाशुपतराजाला खूप आनंद झाला आणि मच्छिंद्रनाथाने रामचरणी मस्तक ठेवले; तोच रामाने त्याला उठवून आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ रामाला म्हणाला, "रामचंद्रा, तुझे नाम सर्व नामांत श्रेष्ठ आहे, तुला माझी अशी विनंती आहे की, मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुझे सहाय्य मिळावे आणि जर तशी इच्छा नसली, तर कोदंड सज्ज करावे व माझ्याशी युध्दाला यावे."
त्याचे वीरश्रीयुक्त बोलणे ऐकून रामाला कौतुकच वाटले. तो म्हणाला, "मच्छिंद्रा, तिन्ही देवांची एकत्र झालेली शक्ती म्हणजेच दत्तात्रेय. त्यांनी तुला सर्व विद्या दिल्या आहेत. सर्व देव तुझ्या मंत्रांचे सहाय्यकर्ते आहेत, मग मी तरी वेगळा का राहीन? तुझ्या मंत्रात माझे नाव येईल तिथे मी सर्व शक्तींसह सहाय्याला येईल. तू कवि म्हणजे विष्णूचाच अवतार व मीही विष्णूचाच अवतार, तुझे व माझे ऐक्यच आहे, नव्हे का? तु धन्य आहेस, माझ्याच वंशजाला माझे दर्शन घडविलेस. आता हा सर्व सृष्टीचा प्राण असा सूर्य मात्र तू अजून व्यर्थ बांधून ठेवला आहेस. त्याला पुन्हा सावध कर." हे ऐकून मच्छिंद्र व सर्व देवही संतोष पावले. नाथाने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतला. सूर्याची बंधनातून सुटका झाली. तो इकडे तिकडे पाहू लागला, तेव्हा सर्व देव जमलेले त्याला दिसले. आपल्याला कोणत्या योगी वीरपुरूषाने बध्द केले, ते पाहण्याची इच्छा सूर्यान प्रकट केली. देवांनी मच्छिंद्राला सांगितले, "सूर्यदेव तुम्हांला दर्शनाला बोलावीत आहेत." मच्छिंद्रनाथ निघाला, पण सूर्याच्या दाहकतेविरूध्द उपाय म्हणून त्याने चंद्राखाचा जप करून मागे व पुढे असे दोन शीतल चंद्र उप्तन्न केले. पर्जन्यास्त्राने सतत थंड पाणी अंगावर पडत राहिल अशी योजना केली व नंतर सूर्याचे दर्शन घेतले. विष्णूजवळ सूर्याने मच्छिंद्रनाथाची चौकशी केली. तो कविनारायण असून कलियुगात ईश्वरी कार्य करीत आहे असे कळाले, तेव्हा सूर्याने त्याला वरदान देऊन, शाबरी विद्येला सहाय्य करीन असे आश्वासन दिले. त्यानंतर अरूणाने सप्त अश्वांना गती दिली व सूर्य गगनमार्गाने प्रवास करू लागला. सर्व देव, रामचंद्र व लक्ष्मण हेही स्वस्थानी गेले. राजासह मच्छिंद्रनाथ राममंदिरात गेला. तेथे यथासांग पूजा करून व पाशुपताचा निरोप घेऊन तो अयोध्येतून पुढे वंगदेशात गेला.
*अल्लक निरंजन...आदेश*🙏🏻
*🔸वरद.🔸*
*🟣गणपती स्पेशल..!*
*पहाटेच्या पावसाच्या हलक्याशा सरींनी त्यांना जाग आली. त्यांनी घडाळ्यात पाहिले ३.३० वाजले होते, मनातल्या मनात म्हणाल्या ५.३० उठायलाच हवे ७.३० ला गुरुजी येतील.*
*आज गणेश चतुर्थी होती. त्या एकट्या असल्या, तरी हौसेने गणपती आणत होत्या ५ दिवसांचा. त्याची षोडषोपचाराने प्रतिष्ठापना करून ५ दिवस वेगवेगळे गोड पदार्थ त्याच्यासाठी करत होत्या. घरातील काल आणून ठेवलेल्या मूर्तीकडे त्यांनी पाहिले, आणि त्या पार त्यांच्या बालपणातल्या काळात हरवल्या.*
*एवढ्याश्या त्या खणाचा परकर पोलका घालून सारख्या गणपतीच्या अवतीभोवती फिरत असत. त्यांच्या माहेरी गणपती अगदी दणक्यात साजरा करत. वेगवेगळे पदार्थ, महिलांचे खेळ, गौरींचा जागर खरंच खूप छान वाटे सगळे. त्यांचा जीव त्या गणेशात अडकलेला असे, मूर्ती विसर्जनाला त्या अत्यंत भावुक होत... गंमत म्हणजे त्यांना गणपतीचे "वरद" हे नाव खूप आवडे. वेगवेगळी आयुधे असोत, मोदक असो... पण एक हात मात्र त्याचा कसा सगळ्यांना वर देण्यासाठी उंचावलेला असतो... म्हणून तो "वरद." आई आणि बाबा नेहमी म्हणत तुला मुलगा झाला की ठेव हो नाव "वरद."*
*यथावकाश तिचे लग्न झाले. नवरा, घरची माणसे खूपच चांगली मिळाली. नवरा अतिशय बुद्धिमान होता, स्वप्रयत्न, स्वकष्ट यावर त्याचा जोर होता आणि त्यानुसार भरभर वरच्या पोस्ट त्याला मिळत गेल्या. एकच मात्र... तो प्रचंड नास्तिक होता, तरीही त्याने तिच्या आस्तिकतेवर कधी आडकाठी आणली नाही. तिला २ मुलीच झाल्या, मुलग्याचे नाव वरद ठेवायचे होते, ती इच्छा मात्र अपूर्णच राहिली. पण मुलीही बापासारख्या प्रचंड हुशार, मेहनती कधी मोठ्या होऊन मोठ्या मोठ्या हुद्यावर नोकरीला लागल्या, नि लग्न करून आपल्या स्वतःच्या घरट्यात विसावल्या ते कळलेच नाही.*
*लग्न झाल्यापासून ही स्वतःला आवड म्हणून गणपती आणत होती. त्याचं सगळं करत होती, मध्येच नवरा म्हणे, चेष्टा करी, तुझा बाप्पा कधीतरी प्रसन्न होऊ देत तरी, दृष्टांत देऊ देत तरी...*
*ती म्हणे, वेळ आली की येईल तो बरोबर. आज तर ती ६५ कडे झुकत होती, नवरा २ वर्षांपूर्वी देवाघरी गेला, मुली लग्न होऊन लांबच्या घरी, आता तिच्याकडे येणारा गणपती आणि ती. त्याच्यासाठी अकरा मोदक करणार उकडीचे, हो अकराच. कारण... आहे कोण खायला? ही दोन खाणार... नि उरलेले कामवालीच्या मुलांना देणार. असूदे... त्यांनाही सणाचा आनंद.*
*असा विचार मनात चालू असताना ५.३० वाजल्याचे तिच्या लक्षात आले आणि ती लगबगीने उठली. तिने भरभर सारे आवरले, पूजेची तयारी केली. ७.३० ला गुरुजी आले, त्यांनी पूजा केली, सुवासिक फुले, पत्री, अगरबत्ती आणि मंद प्रकाशातील गणरायाचे मनमोहक रूप पाहून ती अगदी सुखावली. खोऊन ठेवलेल्या खोबऱ्याचे सारण तिने केले, बटाटा भाजी, पुरी, वरण भात असा सरंजाम झाला, आता फक्त उकड काढून मोदक करणे बाकी होते, केळीचे पान आणायला परसदारी गेली, तिथे पाय घसरून पडली. तेव्हा उजवा हात अंगाखाली आला नि हाड मोडल्याचे तिला जाणवले. घरात आली. उजवा हात तिला हलवताही येईना, शेजारी कुठे सांगायला जाणार... आज सगळीकडे गणपतीची धामधूम, राहुदेत, बघू काय होतेय.*
*थोडा वेळ गेला, नि दरवाजा वाजला म्हणून तिने दार उघडले, दारात एक तेजस्वी डोळ्यांचा, शांत, संयमी चेहऱ्याचा माणूस उभा होता, हिने विचारले काय काम आहे? तो म्हणाला, काकू, "तुम्ही मला ओळखले नाहीत का? "मी तुमच्या मोठ्या मुलीच्या वर्गात होतो. इथेच खालच्या आळीत राहायचो. आलो तर भेटून जावे म्हणून आलो. तिने त्याला घरात घेतले, पण साशंक मनाने तिने स्मरणशक्तीला जोर दिला, पण मुलाचे नाव, चेहरेपट्टी काही आठवेना. त्याला बसा म्हणाली, आणि हळूहळू ती त्याचे निरीक्षण करू लागली. हा आपला बसलाय नि मुलींच्या वेगवेगळ्या आठवणी सांगतोय. त्या ऐकून ती निर्धास्त झाली. म्हणजे हा असेल मुलींच्या वर्गात.*
*जेवणाची वेळ होत आली, तसा हिचा धीर सुटत चालला. हिचा हात तर काम करत नव्हता, नि बाप्पाला मोदकांचा नैवेद्य कसा दाखवणार? तिच्या मनाची घालमेल ओळखली त्याने नि विचारले, "काकू, काही प्रॉब्लेम आहे का? "*
*ही नाही म्हणत असतानाच त्याचे लक्ष तिच्या हाताकडे गेले, सुजलेला हात दिसताच त्याने विचारल्यावर हिने सगळे सांगितले. तो म्हणाला, मी कुकर लावून देतो, ती म्हणाली, बाकी जेवण तयार आहे रे... फक्त मोदक करायचे राहिले आहेत. तो म्हणाला, एवढेच ना? तेही मला येतात, द्या मी करतो.*
*प्रचंड अपराधी भाव तिच्या मनात दाटून आला, कोणाचा कोण त्याला कसे सांगायचे मोदक करायला? ती नको नको म्हणत असतानाही त्याने तांदूळ पीठ शोधून उकड काढली, मोदक केले एकसारखे २१. एखाद्या बाईलाही लाजवेल असे पटकन काम केले त्याने. तिने त्याचा हात धरला नि म्हणाली, गेले कित्येक वर्षात कोणी आले नाही असे आपुलकीने करायला, बस मी तुला जेऊ घालते माझ्या हाताने. जेव भरपूर म्हणजे मलाही समाधान मिळेल.*
*तोही गालातल्या गालात हसत म्हणाला, "काकू जेऊन तर मी जाणारच आहे, कारण मोदक मला प्रचंड प्रिय आहेत".*
*हिने त्याला जेवायला वाढले, आज सणावाराचे कोणीतरी आपल्याकडे हक्काने जेवत आहे, हे पाहून ती खूप आनंदी झाली. त्याचे जेवण आटोपले, तो निघाला तेव्हा तिने पटकन त्याला नाव विचारले, आल्यापासून तिचे मन बेचैन होते, तुम्ही कोण आला होतात असं सांगू हो लेकीला? तिने त्याला विचारले.*
*तो म्हणाला, सांगा तिला "वरद देव" आला होता. येतो पुन्हा नक्की, तृप्त झालो. तो बाहेर पडला नि भरभर फोनजवळ गेली नि तिने लेकीला फोन करून सांगितले, अग तुझ्या वर्गातला तो वरद देव" आला होता आज. मुलगी म्हणाली, "आई, असा कोणी मुलगा माझ्या वर्गात नव्हता नि आपल्या खालच्या आळीतही नव्हता, काय झालं ग? "तिला मुलगी काय म्हणते तेच कळेना आणि तिच्या लक्षात आले, मगाचपासून जेवण वाढण्यापासून ते लेकीला फोन करेपर्यंत ती सगळी कामं उजव्या हाताने करत होती.*
*काय बोलावे ते सुचेना तिला. अश्रुभरल्या डोळ्यांनी गणेशाच्या मूर्तीसमोर ती उभी राहिली आणि म्हणाली, वरद विनायका असाच पाठीशी रहा रे बाबा आज धन्य झाले मी,धन्य झाले.....*
*©सौ राधा रायकर...*
*🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*
*ज्यांना वेदोक्त अथवा पुराणोक्त मंत्रांनी शास्त्रशुद्ध पूजा करता येत नसेल त्यांनी कोणत्या पध्दतीने पूजा करावी ? (१)*
*हल्ली "सहस्त्रशीर्षा" या पुरूषसूक्ताने देवाची, "हिरण्यवर्णा" या श्रीसूक्ताने देवीची व पुराणोक्त मंत्रांनी देवदेवतांची पूजा करणे ही प्रथा जवळजवळ लुप्तप्राय होत चालली आहे. नैमित्तिक प्रसंगाने होणाऱ्या पूजा पुरोहिताकडून होत असल्यामुळे त्या शास्त्रशुद्ध मंत्रांनी होत असतातच. त्यामुळे नेहमीची देवपूजा किमान मंत्रांनी करण्याची इच्छा असणाऱ्या साधकाला निदान इष्टदेवतेचे ध्यान, सोळा उपचार व नाममंत्र आणि प्रार्थना एवढ्या गोष्टी तरी माहीत असाव्यात या उद्देशाने खाली तीन्हीही गोष्टी दिलेल्या आहेत.*
*(अ) विविध देवतांचे ध्यानमंत्र.*
*(१)गणेशध्यान.*
*गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदंष्ट्रं त्रिनेत्रं । ब्रुहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् । अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं । पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि।।*
*(२) विष्णुध्यान.*
*शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं । विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं । वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैनाथम् ।।*
*(३) शिवध्यान.*
*ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरीनिभं चारुचन्द्रावतंसं । रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम् । पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं । विश्वाद्यं विश्ववन्धं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।*
*(४) देवीध्यान.*
*विद्युद्दाम समप्रभां मृगपतिस्कंधस्थितां भीषणां । खन्याभि: करवालखेटविलसध्दस्ताभिरासेविताम् ।। हस्तैश्चक्रदरालिखेटविशिखां चापं गुण तर्जनीं । बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे ।।*
*(५) सूर्यध्यान.*
*ध्येय: सदा सवितृमण्डलमध्यवर्ती । नारायण: सरसिजासनसंनिविष्ट: । केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मयवपुर्धृतशङ्खचक्र: ।।*
*(६) दत्तध्यान.*
*ब्रम्हानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् । एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि ।। (क्रमश:)*
*🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*
*ज्यांना वेदोक्त अथवा पुराणोक्त मंत्रांनी शास्त्रशुद्ध पूजा करता येत नसेल त्यांनी कोणत्या पध्दतीने पूजा करावी ?(२)*
*हल्ली "सहस्त्रशीर्षा" या पुरूषसूक्ताने देवाची, "हिरण्यवर्णा" या श्रीसूक्ताने देवीची व पुराणोक्त मंत्रांनी देवदेवतांची पूजा करणे ही प्रथा जवळजवळ लुप्तप्राय होत चालली आहे. नैमित्तिक प्रसंगाने होणाऱ्या पूजा पुरोहिताकडून होत असल्यामुळे त्या शास्त्रशुद्ध मंत्रांनी होत असतातच. त्यामुळे नेहमीची देवपूजा किमान मंत्रांनी करण्याची इच्छा असणाऱ्या साधकाला निदान इष्टदेवतेचे ध्यान, सोळा उपचार व नाममंत्र आणि प्रार्थना एवढ्या गोष्टी तरी माहीत असाव्यात या उद्देशाने खाली तीन्हीही गोष्टी दिलेल्या आहेत. (पुढे चालू)*
*🌹(आ) नाममंत्र व षोडशोपचार : ('अमुक' ऐवजी त्या त्या देवतेचे नाव घ्यावे. उदा. श्रीगणेशाय नम:, श्रीआर्यादुर्गायै नम:, श्रीव्यंकटेशाय नम:, श्रीसद्गुरुदत्तात्रेयाय नम:, श्रीमंगेशाय नम:, श्री मंगेशमहालसादिप्रमुखपंचायतनदेवताभ्यो नम: इत्यादी. एक देवता असेल तर चतुर्थीचे एकवचन व अनेक देवता असतील तर चतुर्थीचे बहुवचन वापरावे.)*
*🌹षोडशोपचार.*
*(१)अमुकदेवताभ्यो नम: आवाहयामि । (अक्षता वहाव्यात)*
*(२)अमुकदेवताभ्यो नम: आसनं समर्पयामि । (अक्षता वाहून देव ताम्हणात काढावेत.)*
*(३) अमुकदेवताभ्यो नम: पादयो: पाद्यं समर्पयामि । (पायावर पळीभर पाणी घालावे.)*
*(४) अमुकदेवताभ्यो नम: हस्तयो: अर्घ्यं समर्पयामि । (उजव्या हातावर पळीभर पाणी घालावे.)*
*(५) अमुकदेवताभ्यो नम: आचमनीयं समर्पयामि । (उजव्या हातावर पळीभर पाणी घालावे.)*
*(६) अमुकदेवताभ्यो नम: स्नानीयं समर्पयामि । (स्नान घालावे.) (यानंतर देव पुसून मूळ जागी ठेवावेत.)*
*(७) अमुकदेवताभ्यो नम: वस्त्रं समर्पयामि । (प्रत्यक्ष वस्त्र, कापूस वस्त्र वा अक्षता.)*
*(८) अमुकदेवताभ्यो नम: उपवस्त्रं समर्पयामि । (प्रत्यक्ष वस्त्र, कापूस वा अक्षता.)*
*(९) अमुकदेवताभ्यो नम: विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि । (गंध लावावे, अक्षता वाहाव्यात)*
*अमुकदेवताभ्यो नम: । (हरिद्राकुंङ्कुमं, परिमलद्रव्यं समर्पयामि ।) (हळदी, कुंकू, अष्टगंध व अक्षता वहाव्यात.)(स्त्री देवतांसाठी)*
*(१०) अमुकदेवताभ्यो नम: । पूजार्थे पुष्पाणि समर्पयामि ।(फुले वहावीत.)*
*(११) अमुकदेवताभ्यो नम:। धूपं समर्पयामि। (उदबत्ती ओवाळावी.)*
*(१२) अमुकदेवताभ्यो नम:। दीपं समर्पयामि। (नीरांजन ओवाळावे.)*
*(१३) अमुकदेवताभ्यो नम:। नैवैद्यं समर्पयामि। (नैवेद्य दाखवावा.)*
*(१४) अमुकदेवताभ्यो नम:। प्रदक्षिणां समर्पयामि। (स्वत:भोवती प्रदक्षिणा करावी.)*
*(१५) अमुकदेवताभ्यो नम:। नमस्कारान् समर्पयामि। (साष्टांग नमस्कार करावा.)*
*(१६) अमुकदेवताभ्यो नम:। मन्त्रपुष्पांञ्जलिं समर्पयामि। (फुले वहावीत.)*
*🌹प्रार्थना (हात जोडावेत.)*
*आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् । पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।*
*मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।*
*अज्ञानाद् विस्मृतेर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतम् । तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर ।।*
*विसर्गबिन्दुमात्राश्च पदपादाक्षराणि च । न्यूनातिचातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर ।।*
*आपराधसहस्त्राणि क्रियन्तेSहर्निशं मया । दासोSयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।*
*🌹तीर्थग्रहण.*
*शङ्खमध्ये स्थितं तोयं भ्रामितं केशवोपरि । अङ्गलग्नं मनुष्याणां ब्रम्हहत्यां व्यपोहति ।। या मंत्राने शंखात तीर्थ घेऊन देवाभोवती तो शंख ओवाळून.त्यातील तीर्थ सर्वत्र शिंपडावे व पोटात घ्यावे.*
*🌹अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् । अमुक (देवतेचे नाव) पादोदकतीर्थं जठरे धारयाम्यहम् । असेम्हणून देवतीर्थाचे प्राशन करावे.*
*वरीलपैकी आवाहन, आसन, वस्त्र, उपवस्त्र हे चार उपचार अक्षतांनी करता येतात. पाद्य, अर्घ्य, आचमनीय, स्नानीय हे उपचार पळीने पाणी सोडून करावयाचे असतात. इतर उपचार अर्पण करताना चंदन, परिमलद्रव्य, फुले, अगरबत्ती, निरांजन, नैवेद्य इत्यादी उपचार त्यात उच्चार केल्याप्रमाणे करावयाचे असतात. अशाप्रकारे किमान मंत्र असतात. अशाप्रकारे किमान मंत्र वापरूनही उत्कृष्ट समाधान देणारी नित्य देवपूजा करता येते (पूर्ण).....*
*🔸हिंदू धर्मीयगणेश चतुर्थी पूजा.🔸*
*श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे... गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते.....*
*गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे... श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे. नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून, नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे.....*
*याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात... महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे.....*
*गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते... श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ. सोळा उपचारांनी पूजा केली जाते.....*
*यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात... पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत.....*
*मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात... मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।।*
*श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात... त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात.....*
*काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच, सात, दहा दिवस केले जाते.. काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते.....*
*गणपती ही संघटनेची देवता आहे... ऋग्वेदात ब्रहमणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो.....*
*सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली... या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.....*
*🔸गणेश चतुर्थी.🔸
*श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे... गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते.....*
*गाणपत्य संप्रदायाचे हे एक व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे महिनाभर करायचे हे व्रत आहे... नदीकिनारी जाऊन, स्नान करून आपल्या हाताच्या अंगठ्याएवढी मातीची गणेशमूर्ती हातावरच तयार करावी. तिचे सोळा उपचारांनी पूजन करून नदीतच विसर्जन करावी असे हे व्रत आहे. याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात. महिनाभर जमले नाही तर किमान शेवटच्या दिवशी तरी पार्थिव मूर्तीची पूजा करावी अशी यामागे धारणा आहे.....*
*गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते... श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत.....*
*मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात... मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।।*
*श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात... त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच, सात, दहा दिवस केले जाते. काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात, तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते.....*
*गणपती ही संघटनेची देवता आहे... ऋग्वेदात ब्रम्हणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे, असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो.....*
*सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात.....*
*स्रोत: विकिपीडिया...*
ऋषिपंचमी.🔸*
*🟣२८/०८/२०२५- ॠषी पंचमी...🙏*
*भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी हे व्रत करतात... ज्ञान व विज्ञान तसेच पुराणे यांची दिक्षा देण्याचे काम ऋषी मुनी फार पुर्वीपासून करत होते ज्यांचा संदर्भ आजही उपयोगात आणला जातो, अशा या थोर ऋषींच्या कार्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हा ह्या व्रतामागील सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे.....*
कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री हे सात ऋषी आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती ह्यांची पुजा करतात... या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षांतून किमान एक दिवस तरी स्वत:च्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागे संकेत वा संदेश आहे. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे.....*
हे व्रत मुख्यत्वे करुन स्त्रिया रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी करतात... या व्रताने विविध तीर्थांच्या स्नानाचे, विविध प्रकारच्या ज्ञानाचे पुण्य लागते, व मोक्ष मिळतो अशी आख्यायिका आहे.....*
*🌸व्रत कसे करावे... ?*
*या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत...*
आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा...*
पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्या ठेवून कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे...*
या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे...*
दुसर्या दिवशी कश्यपादी सात ऋषी आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे...*
बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते...*
पाळी बंद झाल्यावर स्त्रिया ऋषीऋण फेडण्यासाठी ऋषीपंचमीचे व्रत करतात...*
व्याहृती म्हणजे जन्म देण्याची क्षमता. ७ व्याहृतींना ओलांडण्यासाठी ७ वर्षे व्रत करतात. नंतर व्रताचे उद्यापन करतात...*
*🌸श्रीऋषी पंचमी कहाणी🌸*
*ऎका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी... आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढं एके दिवशी काय झालं? त्याची बायको शिवेनाशी झाली, विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म झाला. देवाची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, “आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा स्वयंपाक कर”. ती मोठी पतिव्रता होती. तिनं चार भाज्या, चार कोशिंबिरी केल्या. खीरपुरीचा स्वयंपाक केला.....*
*इतक्यात काय चमत्कार झाला? खिरीचं भांड उघडं होतं त्यांत सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं... मनांत विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली. पटकन खाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातल नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली.....*
*बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, “मी उपाशी आहे. मला अन्न नाही, पाणी नाही, खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं... ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कोलीताने माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू....”?*
*बैलानं तिला उत्तर दिलं, “तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालविलास, त्याचा संपर्क मला झाला... त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं, मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं” हे भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठुन बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला.....*
*दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला... तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, “तु असा चिंताक्रांत का आहेस”? मुलानं सांगितलं, “माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल? ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.....”*
*तेव्हा ऋषींनी सांगितलं, “तू ऋषिपंचमीचं व्रत कर... ते व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं.....*
*ह्या व्रतानं काय होतं...? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नानाप्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनी इच्छिलं कार्य होतं”.....*
*मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापास दिलं... त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानांत बसून स्वर्गाला गेली. मुलाचा हेतु पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो.....*
*ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण...*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
[27/08, 7:33 pm] +91 94201 13373: ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
*'घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?*
*कोणतीही आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.*
*आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे.*
*वैशिष्ट्ये :*
*(१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत.*
*(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.*
*(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.*
*(४) बऱ्याच जणांना असे वाटते की, ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते.*
*(५) यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.*
*(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.*
*आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया.*
*१) घालीन लोटांगण वंदीन चरणl*
*डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |*
*प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |*
*भावे ओवाळीन म्हणे नामा |*
*वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे.*
*अर्थ...*
*विठ्ठलाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.*
*२) त्वमेव माता च पिता त्वमेव |*
*त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |*
*त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |*
*त्वमेव सर्व मम देव देव |*
*हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.*
*अर्थ...*
*तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.*
*(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |*
*बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात |*
*करोमि यद्येत सकल परस्मै |*
*नारायणापि समर्पयामि ||*
*हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.*
*अर्थ…*
*श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.*
*(४) अच्युतम केशवम रामनारायणं |*
*कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |*
*श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |*
*जानकी नायक रामचंद्र भजे ||*
*वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.*
*अर्थ…*
*मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.*
*हरे राम हरे राम |*
*राम राम हरे हरे |*
*हरे कृष्ण हरे कृष्ण |*
*कृष्ण कृष्ण हरे हरे |*
*हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे. (ख्रिस्तपूर्व काळातील असावे) कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे.*
*अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.....*
*वैश्विक गणेश यात्रा / २*
*🔸चीन मधील ‘भगवान विनायक’🔸*
*प्रशांत पोळ.*
*चीन म्हणजे पोलादी पडद्याआडचा देश. या अश्या चीन चे आणि भारताचे संबंध फार प्राचीन आहेत. प्राचीन म्हणजे किती जुने..? काही निश्चित सांगता येणं कठीण आहे. पहिल्या शतकात चीन मध्ये असलेल्या हिंदू मंदिरांचे पुरावे मिळाले आहेत. मात्र हिंदू धर्माचा प्रादुर्भाव चीन मध्ये या पेक्षा ही आधी झाला असावा.*
*आज सुध्दा चीन मध्ये अनेक हिंदू मंदिरं आहेत. आणि जिथे हिंदू मंदिरं आहेत, तिथे गणरायाची उपस्थिती ही असतेच असते. चीन च्या ह्या हिंदू मंदिरांमध्ये श्री गणेशाच्या अनेक प्राचीन मूर्ती आहेत. येथे गणेशाला बुध्दी आणि समृध्दी ची देवता मानलं जातं.*
*चीन च्या फुजियान प्रांतात, क्वांझाऊ शहरात, जवळपास वीस हिंदू मंदिरं आहेत. ही सारी मंदिरं साधारण दीड हजार वर्ष जूनी आहेत. त्या काळात चीन चा, भारताच्या तामिळ भाषिक क्षेत्राशी मोठा व्यापार चालायचा. आजच्या तामिळनाडू मधून अनेक वस्तु चीन ला जायच्या, आणि चीन हून साखर आणि इतर पदार्थ आयात केले जायचे. स्वाभाविकतः या क्वांझाऊ शहरात मोठ्या संख्येने तामिळ व्यापारी आणि त्यांची माणसं राहायची. त्यांनीच ही मंदिरं बांधली. (२०१९ च्या डिसेंबर मध्ये चीन चे राष्ट्रपती शी जिनपिंग भारतात आले असताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बरोबर ची एक बैठक तामिळनाडू च्या ‘महाबलीपुरम’ येथे ठेवली होती. सातव्या आणि आठव्या शतकात, पल्लवांच्या काळात, भारत आणि चीन मधील व्यापार येथून होत होता, त्याला उजळणी देण्यासाठी महाबलीपुरम ची निवड केलेली होती)*
*सन ६८५ च्या आसपास, तेग राजवंश्या च्या काळातली ही मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये नंतर स्थानिक चीनी लोक ही यायला लागले आणि पूजा करायला लागले. या मंदिरांवर मेंदारिन (चीनी), संस्कृत आणि तामिळ भाषेतील शिलालेख आहेत. या सर्व मंदिरांमध्ये भगवान गणेश विराजमान आहेत. चीन च्या गंसू प्रांतात तुन-हुयांग (की दुन-हुयांग) शहरातील बौध्द मंदिरांमध्ये श्री गणराय, कार्तिकेयांबरोबर दिसतात.*
*चीन च्या उत्तर भागात झालेल्या उत्खननात जी गणेश प्रतिमा मिळाली आहे, ती कार्बन डेटिंग च्या अनुसार सन ५३१ ची आहे. चीन च्या अगदी दक्षिण टोकावर असलेले गुआंगदोंग (Guangdong) हे बंदर (port) आहे तर क्वांझाऊ किंवा चिंचू ही सुध्दा बंदरांची शहरं आहेत. तामिळ व्यापारी, सागरी मार्गाने, याच बंदरांच्या रस्त्याने चीन मध्ये यायचे. स्वाभाविकतः या सर्व बंदरांच्या आसपास अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष आजही मिळतात. या शहरातील पुरातत्व संग्रहालयांमध्ये भगवान शंकर, गणेश, दुर्गा देवी इत्यादींच्या अनेक प्रतिमा आहेत.*
*सागरी मार्गाशिवाय, भारतीयांचे चीन ला जायचे इतरही मार्ग होते. आसाम च्या कामरूप हून, ब्रम्हदेशाच्या रस्त्याने भारतीय व्यापारी चीन ला जायचे. काश्मीर च्या सुंग-लिंग हून चीन ला जाणारा अजून एक मार्ग होता. दुसर्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत, दीडशे हून जास्त चीनी विद्वानांनी भारतातील संस्कृत ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद करायला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते. वेदांना चीनी भाषेत ‘मांग – लून’ (ज्ञान आणि बुध्दीचे विज्ञान) म्हटले जाते. अनेक ‘संहिता’ आणि ‘शास्त्रांचा’ अनुवाद चीनी भाषेत उपलब्ध आहे.*
*गंमत म्हणजे यातील काही ग्रंथ असे आहेत, जे भारतात आलेल्या मुस्लिम आक्रांतांनी नष्ट केले होते, परंतु यांचा चीनी अनुवाद उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, ‘सांख्यकारिका’ हा ग्रंथ मूळ संस्कृत मध्ये कुठेही सापडत नाही. मात्र त्याचा चीनी अनुवाद – ‘जिन की शी लून’ (Jin Qi Shi Lun) उपलब्ध आहे. आता या चीनी ग्रंथाचा पुन्हा संस्कृत भाषेत अनुवाद केला गेला आहे. असे इतरही ग्रंथ आहेत.*
*आज सुध्दा चीन मध्ये, चीनी भाषा बोलणारे, परंतु हिंदू जीवन पध्दती आणि परंपरा मानणारे लोकं राहतात. यांची संख्या तुलनेने कमी आहे. म्हणून चीन च्या पाच प्रमुख पंथांमध्ये यांचा समावेश नाही. परंतु हा समुदाय आज सुध्दा भारतीय सण आणि उत्सव उत्साहाने साजरा करतो. ‘गणेश उत्सव’ हा चीनी पध्दती ने साजरा केला जातो.*
*तिबेट*
*कधी सार्वभौम राष्ट्र असलेलं तिबेट, आज चीन चा एक प्रांत झालेला आहे. चीन चा भाग नसताना तिबेट हा देश हिंदू आणि बौध्द परंपरांचा देश होता. म्हणूनच तिबेट मध्ये अनेक ठिकाणी गणेश मंदिरं आहेत तसेच गणेश प्रतिमा आणि गणेशाची चित्र बर्याच ठिकाणी दिसतात. बौध्द परंपरेच्या महायान आणि वज्रायान पंथात गणपतींचे एक विशिष्ट स्थान आहे. ते फक्त विघ्नहर्ता नाहीत, तर बुध्दीचे देवता आहेत. तिबेटी भाषेत गणपतींना ‘महा-रक्त’ सुध्दा म्हटलं जातं. तिबेट मध्ये श्री गणेश, ‘विनायक गणेश’ नावाने प्रसिध्द आहेत. हे ‘आर्य महा गणपती’ परंपरेचे गणेश आहेत. तिबेट चे, या विषयाचे अभ्यासक, रॉबर्ट ब्राऊन (Robert L. BROWN) यांनी एक पुस्तक लिहिलंय, ‘Ganesh, studies of an Asian God’. यात त्यांनी लिहिलंय की तिबेट च्या काग्युर परंपरेत असं म्हटल्या गेले आहे की महात्मा बुध्द यांनी, आपला प्रिय शिष्य आनंद याला ‘गणपती हृदय मंत्रा’ (किवा ‘आर्य गणपती मंत्र’) ची दीक्षा दिली होती. म्हणूनच बौध्द प्रभाव असलेल्या देशांमध्ये, बौध्द मंदिर आणि स्तुपांच्या बाहेर गणेशाची मूर्ती असते.*
*(तिबेटी भाषेत ‘विनायक स्तुति’, जी रोमन लिपि मध्ये दिलेली आहे) –*
*oṃ namo ‘stu te* *mahāgaṇapataye svāhā |*
*oṃ gaḥ gaḥ gaḥ gaḥ gaḥ gaḥ gaḥ gaḥ |*
*oṃ namo gaṇapataye svāhā |*
*oṃ gaṇādhipataye svāhā |*
*oṃ gaṇeśvarāya svāhā |*
*oṃ gaṇapatipūjitāya svāhā |*
*oṃ kaṭa kaṭa maṭa maṭa dara dara vidara vidara hana hana gṛhṇa gṛhṇa dhāva dhāva bhañja bhañja jambha jambha tambha tambha stambha stambha moha moha deha deha dadāpaya dadāpaya dhanasiddhi me prayaccha |*
*मंगोलिया*
*फक्त ३३ लाख लोकसंख्या असलेल्या, चीन च्या ह्या शेजारील देशात, गणेशाची प्रभावी उपस्थिती आहे. दुर्दैवानं आपण मंगोलियाला ओळखतो ते छिगीज खान (ज्याला आपण ‘चंगेज खान’ म्हणतो) च्या नावाने. मात्र मंगोलिया हा देश एके काळी पूर्ण पणे हिंदू संस्कृतीत रमलेला आणि मुरलेला देश होता. हा देश आजही हिंदू संस्कृतीच्या प्रतिकांना अभिमानाने धारण करतो.*
*त्यांच्या राष्ट्रध्वजाला ते सोयंबू (स्वयंभू च अपभ्रंश) म्हणतात. या देशातील अनेक मंगोल, आजही आपलं नाव संस्कृत शब्दांवरून ठेवतात. मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची नावं आहेत – आंनंदिन अमर (१९३२ ते १९३६) आणि जम्सरांगिन शंभू (१९५४ ते १९७२). महिन्यांची आणि आठवड्यांची मंगोल नावं ही, भारताच्याच धर्तीवर आहेत. उदाहरणार्थ रविवार ला आदिया (आदित्यवार), सोमवार ल सोमिया, मंगळवार साठी संस्कृत शब्द ‘अंगारक’ आहे. बुधवार साठी बुध्द, गुरुवार किंवा बृहस्पतिवार साठी व्रिहस्पत, शुक्रवार ला सुकर आणि शनिवार साठी सांचिर हे नाव आहे.*
*अश्या मंगोलियात, श्रीगणेशाची पूजा होणं स्वाभाविकच आहे. येथे अनेक बौध्द मंदिरात गणेशाची प्रतिमा आहे.*
*आपले पूर्वज, आपल्या विश्वव्यापी प्रवासात, आपल्या आराध्य दैवतांनाही बरोबर घेऊन जात होते. ठिकठिकाणच्या स्थानिक लोकांमध्ये भारतीयांची चांगली स्वीकार्यता होती. आणि म्हणूनच आपल्या आराध्य दैवतांची स्थानिक लोकं ही पूजा करू लागायचे. विशेषतः गणपतींना विघ्नहर्ता म्हटलं गेलं आहे. ही शुभारंभाची देवता आहे. आणि म्हणूनच, जगाच्या कानाकोपर्यात श्री गणेशाची स्वीकार्यता आहे, आणि अस्तित्वही..!*
*प्रशांत पोळ.*
*_(उद्या ब्रम्हदेशातील, अर्थात मियांमार मधील गणपती)_*
*#वैश्विक_गणेश #GlobalGanesh*
*🔸चौदा विद्या, चौसष्ट कला.🔸*
*श्री गणेश हे चौदा विद्या, चौसष्ट कलांचे दैवत आहे... श्रीगणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण श्रीगणेशपूजा करीत असतो... पण गणरायाच्या या चौदा विद्या, चौसष्ट कला तुम्हाला माहिती आहे का चौदा विद्या .....?*
*श्रीगणेश विषयक माहिती असलेले प्राचीन ग्रंथ श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्गलपुराण हे आहेत... आजही हे प्राचीन ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत.....*
*श्रीगणेशांना चौदा विद्या अवगत होत्या, श्रीगणेश मोठे ज्ञानी होते... ज्याच्याजवळ जे असते तेच तो दुसर्याला देऊ शकतो. श्री गणेश स्वत: ज्ञानी व प्रगल्भ बुद्धिमान असंल्यामुळेच त्यांचा आदर्श आपण ठेवला, तर आपणही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागतो. अधिक बुद्धिमान होण्यासाठी अधिक मेहनत घेऊ लागतो. श्रीगणेशाला बुद्धिदाता म्हणजे बुद्धी देणारा असे म्हटले आहे.....*
*श्रीगणेशांना पुढील चौदा विद्या अवगत होत्या... (१) ऋग्वेद (२) यजुर्वेद (३) सामवेद (४) अथर्ववेद (५) छंद (६) शिक्षा (७) व्याकरण (८) निरुक्त (९) ज्योतिष (१०) कल्प (११) न्याय (१२) मीमांसा (१३) पुराणे आणि (१४) धर्मशास्त्र.....*
*काही विद्वानांच्या मते पुढील चौदा विद्या श्रीगणेशाला अवगत होत्या...*
*(१) आत्मज्ञान (२) वेदपठण (३) धनुर्विद्या (४) लिहीणे (५) गणित (६) पोहणे (७) विकणे (८) शस्त्र धरणे (९) वैद्यक (१०) ज्योतिष (११) रमलविद्या (१२) सूपशास्त्र (१३) गायन आणि (१४)गारुड.*
*आणखी इतर ग्रंथांमधून वेगवेगळ्या विद्या सांगितलेल्या आहेत... आधुनिक काळांत विद्यांची संख्याही अनेक पटीने वाढली आहे. यावरून एकच म्हणता येईल की, गणपती हे सकल विद्यांचा अधिपती होते. सकल ज्ञानी होतज. बुद्धिमान होते. म्हणूनच अथर्वशीर्षामध्ये श्रीगणेशांना ‘ तू ज्ञान आहेस ‘ असे म्हटले आहे.....*
*श्रीगणेशांना चौदा विद्यांबरोबरच चौसष्ट कलाही अवगत होत्या... शिवतत्त्वरत्नाकर ग्रंथामध्ये पुढील चौसष्ट कला सांगितलेल्या आहेत.....*
*(१) इतिहास (२) आगम (३)काव्य (४) अलंकार (५) नाटक (६) गायकत्व (७) कवित्व (८) कामशास्त्र (९) दूरोदर (१०) लिपिज्ञान (११) लिपिकर्म (१२) वाचन (१३) गणन (१४) व्यवहार (१५) स्वरशास्त्र (१६) शाकुन (१७) सामुद्रिक (१८) रत्नशास्त्र (१९) गंज-अश्व-रथ-कौशल (२०) मल्लशास्त्र (२१) सूपशास्त्र (२२) बागाईत (२३) गंधवाद (२४) धातुवाद (२५) रससंबंधी (२६) बिलवाद (२७) अग्निसंस्तम्भ (२८) जलसंस्तम्भ (२९) वाक् स्तंम्भन (३०)वायुस्तंभन (३१) वशीकरण (३२) आकर्षण (३३) मोहन (३४) विद्वेषण (३५) उच्चाटन (३६) मारण (३७) कलवंचन (३८) परकायाप्रवेश (३९) पादुकासिद्धी (४०) वाक्सिद्धी (४१) गुटिकासिद्धी (४२) ऐन्द्रजालिक (४३) अंजन (४४) परदृष्टिवंचन (४५) स्वरवंचन (४६) मणिभूमिकर्म (४७) मंत्रऔषधी (४८) कर्म (४९) चित्रक्रिया (५०) लेहक्रिया (५१) अश्मक्रिया (५२) मृत्क्रिया (५३) औषधक्रिया (५४) वेणुक्रिया (५५) चर्मक्रिया (५६) अम्बरक्रिया (५७) अदृश्यकरण (५८) दन्तिकरण (५९) मृगयाविधी (६०) वाणिज्य (६१) पशुपालन (६२) कृषी (६३) आसनकर्म (६४) युद्धकौशल्य.....*
*आधुनिक कालात कलांची संख्याही अनेकपटीने वाढली आहे... या काळात माणसाने एक तरी कला आत्मसात करणे आवश्यक आहे. आयुष्यात प्रत्येकाला आवडीच्या विषयातील नोकरी मिळतेच असे नाही. पण आवडीच्या विषयाची कला मात्र जोपासता येते. दु:खाच्या वेळी अवगत असलेली कला मनाला आधार देते तर सुखाच्यावेळी कला माणसाचे सुख द्विगुणित करीत असते.....*
*स्रोत: आंतरजाल, By शरयू काकडे...*
*🔸श्री गणेश अथर्वशीर्ष.(मराठी)🔸*
*श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे... ते अथर्ववेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेशविद्या सांगितलेली असून गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्व आहे. श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे.....*
*थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर... शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय असा याचा अर्थ लावला जातो.....*
*यामध्ये प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी तो गणपती म्हणजे परब्रह्म होय असे त्याचे उदात्तीकरण केले आहे... गणपती हा देहांच्या पलीकडचा असला तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे. यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक हजार वेळा पठन केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हटले आहे.....*
*मराठी अथर्वशीर्ष...*
*ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। तू साक्षात् नित्य तो आत्मा.....॥१॥*
*ऋत मी सत्य मी वदे .....॥२॥*
*करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरु - शिष्यांस रक्ष तू। मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण वरुनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥.....*
*जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा..... ॥४॥*
*सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। तूचि वायु नि आकाश, वाणी स्थाने ही चार तू..... ॥५॥*
*तू जसा त्रिगुणां- पार, त्रिदेहांच्याहि पार तू। तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णुही। तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष, नि स्वर्गही। तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही.....॥ ६॥*
*आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । ‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो .....॥७॥*
*एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो..... ॥ ८॥*
*एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । द्न्त नी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। रक्त- चन्दन- लिप्तांगा, रक्त- पुष्पा- सुपूजिता । भक्तावरी दया कर्त्या, अच्युता जग-कारणा। सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा .....॥ ९॥*
*वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन .....॥१०॥*
*फलश्रुती...*
*या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मरूप होतो... त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अज़ाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळीं पठण करणारा रात्रीं (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहित होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी अशा अनधिकार्याीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल..... ॥११॥*
*या अथर्वशीर्षानें जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें वाक्य आहे. (याचा जप करणा-याला ) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं..... ॥१२॥*
*जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो... जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होतें..... ॥१३॥*
*आठ ब्राह्माणांना योग्य प्रकारें (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो... सूर्यग्रहणांत, महानदीच्या काठी किंवा गणपति प्रतिमेजवळ जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हें असें जाणतो. असें हें उपनिषद् आहे.....*
*आंतरजल...*
*🔸 उंदीर गणपतीचे वाहन कसा झाला?🔸*
*गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच... उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. याबद्दल एक कहाणी या प्रकारे आहे,....*
एकदा इंद्रसभेत गंभीर विषयावर चर्चा सुरू होती परंतू क्रौंच नावाच्या गंधर्वाचे मन अजून कुठेतरी रंगलेले होते... क्रौंच तेथे उपस्थित असलेल्या अप्सरांसोबत थट्टा करत होते. हे बघून इंद्र नाराज झाले आणि त्यांनी गंधर्वाला शाप दिला, की आता तू उंदीर होशील. शापाने क्रौंचाचे बलवान उंदरात परिवर्तन झाले. तो उंदीर पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडला.....*
या उंदराने पराशर ऋषींच्या आश्रमात खूप धुमाकूळ घातला. आश्रमातल्या अन्नधान्याची नासाडी करण्यास सुरुवात केली... आश्रमातील ग्रंथ-पोथ्या, कपडेसुद्धा त्याने कुरतुडून टाकले. त्याने आश्रमवासी आणि पराशरऋषींना भंडावून सोडले. शेवटी पराशरऋषींनी श्रीगजाननाची प्रार्थना केली, ‘ हे गजानन! आम्हाला या उंदराच्या त्रासापासून सोडव....’*
मग गणपतीने तेथे प्रकट होऊन आपला पाश उंदरावर टाकला... पाताळात उंदीराचा पिच्छा करत पाशने त्याचा कंठ बांधला गेला आणि गणपतीसमोर प्रस्तुत झाला. तेव्हा तो उंदीर आपली सुटका करावी म्हणून गणपतीकडे गयावया करु लागला.....*
उंदीर शरण आला म्हणून गणपतीने त्याला वर मागण्यास सांगितले. पण उंदराचा उन्मत्तपणा अजूनही गेला नव्हता... त्याने गर्विष्ठपणे गणपतीलाच म्हटले, ‘मला तुझ्याकडून कोणताही वर नको... हवं असल्यास तूच माझ्याकडे वर माग.....’*
त्याचा हा उद्धामपणा पाहून गणपती हास्यस्मित करत लगेच म्हणाले, ‘जर तूझं वचन सत्य आहे, तर आजपासून तू माझे वाहन हो...’ मूषकने तथास्तु म्हटले आणि गणपती लगेच उंदराच्या पाठीवर आसनस्थ झाले.....*
मग मात्र गणपतीच्या भाराने तो उंदराच्या प्राणावर संकट ओढावले, तेव्हा उंदराने प्रार्थना केली की, मला तुझा भार सहन करणे योग्य करं. आणि त्या दिवसापासून उंदीर गणपतीचे वाहन झाला.....*
*स्रोत: आंतरजाल, वेबदुनिया...*
*🔸अष्टविनायक🔸*
*🔸(२) श्री. चिंतामणी- थेऊर.🔸*
*येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिल मुनींनी केली... कपिल मुनींजवळ एक चिंतामणी नावाचे रत्न होते. हे रत्न त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीत असे. एकदा गणासूर त्यांच्या आश्रमात आला असता त्यांनी या रत्नाच्या सहाय्याने त्याला पंच पक्क्वन्नाचे जेवण दिले. हे पाहून गणसुर स्तंभित झाला. त्यास रत्नाचा मोह निर्माण झाला. त्याने कपिल मुनींकडे या रत्नाची मागणी केली व त्यांनी नकार देताच गानासुराने ते रत्न हिसकावून घेतले. कपिल मुनींनी गणेशाची उपासना केली. विनायकाने प्रसन्न होऊन येथील कदंब वृक्षाखाली गानासुराचे पारिपत्य केले. तेव्हा मुनींनी विनायकाच्या गळ्यात ते रत्न बांधले. तेव्हापासून गणेशाला चिंतामणी नावाने संबोधले जाऊ लागले.....*
*गौतम ऋषींच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने याच गणेशाची आराधना केली असेही ऐकिवात आहे... या क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थेकडे आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींनी तपश्चर्या केली असता विनायकाने वाघाच्या रुपात त्यांना दर्शन दिले.....*
*मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला पूर्वी कदंब तीर्थ वा चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे... कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभा-यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभु मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत.....*
*स्थान : तालुका – हवेली, जिल्हा- पुणे, पिन. को. ४१२ ११०*
*अंतर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९ पासून जवळ.*
*पुणे – हडपसर- लोणी- थेऊर फाटा २०, थेऊर फाटा ते थेऊर ५, पुणे २५.*
*थेऊर- केसनंद -वाघोली – पुणे ३०*
*थेऊर-केसनंद-लोणीकंद-शिक्रापूर-रांजणगाव ४४.*
*थेऊर-केसनंद-लोणीकंद-शिक्रापूर-तळेगाव -खापोली-महाड व पाली ९९*
*थेऊर-केसनंद-लोणीकंद-आळंदी-चाकण-नारायणगाव ते ओझर व लेण्याद्री १०९ कि.मी.*
*उरुळीकांचन : म. गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र.*
*भुलेश्वर : पुरातन कलात्मक शिवमंदिर.*
*केडगाव बेट : नारायण महाराज यांचा आश्रम व दत्ता मंदिर.*
*फुलगाव : स्वामी स्वरूपानंद स्थापित भीमे वरील गुरुकुल पद्धतीचा श्रुतीसागर आश्रम व वेदांत रिसर्च सेंटर.*
*तुळापुर : भीमेकाठी पुरातन संगमेश्वर मंदिर. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक. नौका विहाराची सोय.*
*मरकळ : भीमेकाठी विपश्यना केंद्र व नौका विहार...*
*स्त्रोत: आंतरजाल, विकिपीडिया...*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*श्री गणेशाची विविध रूपे आणि त्यांची स्थाने.*
*‘संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी ७०० वर्षांपूर्वी वर्णन केले, तो गणेश हे भारतियांचे अत्यंत प्रिय दैवत आहे. आज प्रचलित परंपरागत ‘एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् । पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥ (अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत आणि हातांमध्ये अंकुश अन् पाश धारण केला आहे, अशा श्री सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.)’, अशी ही गणेशमूर्ती आहे; पण आकार आणि स्वरूप यांतील विविधता गणपतीच्या मूर्तीइतकी अन्य कोणत्या देवतेच्या मूर्तीत आढळत नाही. गणेशाच्या मूर्तीचे आकार आणि प्रकार असंख्य आहेत.....*
*गणेशमूर्तीमध्ये मुख, हात, आयुधे, वाहन या संदर्भात अनेक प्रकार रूढ आहेत, तसेच नृत्यमूर्ती, उभी मूर्ती, बसलेली मूर्ती किंबहुना झोपलेली गणेशमूर्ती उपलब्ध आहे. पर्वत, वृक्ष, फळ यांतूनही श्री गणेशाचे प्रकटीकरण झालेले आहे. अर्धनारी गणेश, मुरलीधर गणेश आहेत. शुभ्र रंगापासून गडद काळ्या रंगापर्यंत विविध रंगातील श्री गणेशाची विविधता पहायला मिळते. रांगणार्या गणपतीची बालमूर्ती वेलोर किल्ल्यातील ‘जलगंधेश्वर’ मंदिराच्या कल्याण मंडपातील खांबावर आढळते. श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या मंदिरात श्रीकृष्णाप्रमाणे मुरली वाजवणारा मुरलीधर गणेश आणि हैदराबादचे सालारजंग वस्तूसंग्रहालय येथे तशा मूर्ती आहेत.....*
*१. स्वयंभू मूर्ती...*
*स्वयंभू मूर्ती, म्हणजे स्वतःच अस्तित्वात आलेली, जागृत आणि विशेष दैवीशक्तीने युक्त अशी मूर्ती. या स्वयंभू मूर्ती प्रचंड शिळेसारख्या असून त्या निराकार असतात. त्यात गणेशाचे वैशिष्ट्य- गंडस्थळ, शुंडा, गजमस्तक असा आकार भासमानही दृश्य असतो. उदाहरणार्थ काश्मीरमधील गणेशबल, हरिपर्वत आणि गणेशघाटी ही ३ पुराणोक्त स्वयंभू गणेश स्थाने सुप्रसिद्ध आहेत.....*
*२. मानवमुख गणेश...*
*तमिळनाडू राज्यातील तिरूचेन्द गाट्टंगुडी येथील गणपतीच्या मूर्तीला हत्तीचे मुख नसून मानवाचे मुख आहे त्याचे नाव ‘विघ्नांतक गणपती’.....*
*३. मातृकांसहित गणेश...*
*ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवती, वाराही, महेंद्री आणि चामुंडी या सप्तमातृका आहेत. वेरूळ लेण्यांतील सप्तमातृकांच्या डाव्या बाजूला प्रारंभी गणेश आहे. याखेरीज कुंभकोणम, बेलूर अमरकंटक, एहोळे या ठिकाणी मातृकामूर्ती आहेत. पुण्याजवळील यवतेश्वर डोंगरावर लेणी आहे. तेथे मातृकामूर्ती असून त्यातील आठवी मातृकाच ‘गणेशी’ किंवा ‘विनायकी’ म्हणून दाखवलेली आहे. या शिल्पाचा काळ तेराव्या शतकातील मानण्यात येतो. विवाहादी मंगलप्रसंगी मातृकापूजनाचे वेळी गणेशपूजन असतेच.....*
*४. नृत्यगणेश...*
*८ हातांच्या या नृत्यमूर्तीच्या हातातील आयुधे म्हणजेच पाश, अंकुश, अपूप म्हणजे पानगा, कुर्हाड, दंत, वलय, अंगठी अशी आहेत आणि आठवा हात नृत्यमुद्रा करण्यासाठी मोकळा आहे. कर्नाटकातील होयसळेश्वर मंदिरात (हळेबीड) असलेली नृत्यमूर्ती अतीमनोहर आहे.....*
*५. द्विभुज गणेश...*
*कलियुगात जेव्हा श्री गणेशाचे अवतरण होईल, ते द्विभुज असेल; पण अखेरच्या टप्प्यात. सध्या मागील युगातील चतुर्भुज गणपतीच सर्वत्र प्रचलित आहे. कलियुगातील गणेशाच्या मूळ स्वरूपाला जाणून काही जाणकार कलाकारांनी द्विभुज मूर्ती बनवल्या आहेत. महाराष्ट्रात तरी त्या बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत. त्या सर्व मूर्ती अतीप्रचीन आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भांदक हे सहस्रोे वर्षांपूर्वीचे प्राचीन शहर. भांदक-भद्रावती येथील एका टेकडीवर द्विभुज गणेशाची अतीप्राचीन अशी मूर्ती आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे अतीप्राचीन द्विभुज गणेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातच रेडी येथे वर्ष १९७६ मध्ये सापडलेली अतीप्राचीन द्विभुज मूर्ती गणेशाची मोठी मूर्ती आहे. बहुतेकांना ठाऊक असलेली द्विभुज मूर्ती कर्नाटकातील गोकर्णाची आणि त्यानंतर इडगुंजीची. दक्षिणेत सुंदरेश्वराच्या देवालयातील प्रवेशद्वाराशी द्वारपालाच्या अगदी जवळ एक द्विभुज गणेश कोरलेला आहे. द्विहस्त गणपतीची एक धातूमूर्ती चेन्नईच्या संग्रहालयात आहे. याखेरीज कंबोडिया, जावा, बाली इत्यादी बृहत्तरभारत देशात दोन हातांच्या मूर्ती आहेत. जपानमध्ये दिसणारी प्रसिद्ध कांगितेनमूर्ती द्विहस्तच आहे.....*
*६. चतुर्भुज गणेश...*
*४ हातांची ही भारतात आढळणारी सार्वत्रिक मूर्ती आहे. बहुतेक सर्व गणेशस्थानांतील मूर्ती ४ हात असलेल्या दिसतात.....*
*७. षड्भुज गणेश...*
*संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाच्या आरंभी ॐकार गणेशाचे स्तवन केले आहे. त्यामध्ये गणेशाला ६ हात असून ‘त्याच्या मागील दोन्ही हातात परशू आणि अंकुश आहे. डावीकडील एका हातात तुटलेला दात आणि एका हातात मोदक आहे. उजव्या बाजूच्या दोन हातांपैकी एका हातात कमळ आणि एक हात अभयहस्त आहे’, असे वर्णन केले आहे. पंजाबमधील काकडा जिल्ह्यातील वैजनाथ मंदिरात षड्भुज गणेशाची मूर्ती आहे.....*
*८. अष्टभुज गणेश...*
*अष्टभुज मूर्ती ही तंत्रमार्गातील असावी. भिंगार (अहिल्यानगर) येथील उत्खननात मिळालेल्या अष्टभुज तांडवमूर्तीचा जारणमारण, विद्येशी संबंध असल्याचा उल्लेख सापडतो. ग्वाल्हेर संग्रहालयात ८ हातांची गणेशमूर्ती असून ती सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोंड राणी हिराई हिच्या काळातील आहे. याखेरीज भाळवणी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर; कोरेगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर आणि कारंजा बहिरम, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती येथेही अष्टभुज गणपति आहेत.....*
*९. दशभुज गणेश...*
*हेरंब, उच्छिष्ट आणि वल्लभ ही गणेशाची ध्याने १० भुजांची आहेत. नेपाळमधील हेरंब हा १० हातांचा आहे. महागणपति ध्यानाला बसलेला असा दशभुज गणपति सापडतो. यातील ४ हात गणपतीचे आणि बाकीचे ६ हात ब्रह्मा, विष्णु अन् महेश यांचे मानले जातात. पुणे शहर आणि परिसरात ३ दशभुज गणपति आहेत. पर्वती पायथ्याशी ‘खळदकरांचा गणपति’ हा ‘नर्मदेश्वर’ असल्याचे म्हणतात. पौड फाटा, पुणे आणि जांभूळपाडा येथील गणपति पाषाणाचा आहे. नाशिक येथे श्री दशभुज सिद्धिविनायक मंदिर आहे....*
*१०. अर्धनारी नटेश्वर रूप आणि दशभुज गणेश...*
*श्री गायत्री मंदिर, गोरेगाव, जिल्हा रायगड येथे तांब्याची अगदी छोटी गणपतीची मूर्ती आहे. याला ‘विद्यागणेश’ म्हणतात. हा पंचधातूचा, अर्धनारी नटेश्वर रूपातील, म्हणजे अर्धशरीर स्त्रीरूपी आणि पुरुष रूपातील आहे, असे समजतात. ही मूर्ती फारच लहान असल्याने याचे १० हात नीट दिसत नाहीत. दोन्ही बाजूला वरचे ४ हात एकमेकाला जोडलेले असून खाली सुटा एक एक हात आहे.....*
*११. द्वादशभुजा गणेश...*
*१२ हात असलेली गणेशमूर्ती क्वचितच पहायला मिळतात. औरंगाबाद येथे थोरल्या बाजीरावाने दिलेली मूर्ती १२ हातांची आणि उजव्या सोंडेची आहे. महागणपति मंदिर, काटस गार्डन, बडनेरा, जिल्हा अमरावती येथे ३ नेत्र असलेली आणि १२ हातांची गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. सातारा येथे दांडेकर घराण्याच्या देव्हार्यातील १२ हातांच्या गणपतीची तांब्याची मूर्ती आहे.....*
*१२. त्रिशुंड गणपति...*
*पुण्यातील ही मूर्ती एकमेव दिसते. सयामी हस्तलिखितात ‘कोकणानेश्वरा’चे गणेशचित्रही त्रिशुंड (३ सोंड) दिसते; परंतु त्या शुंडांप्रमाणे मुखही ३ आहेत. पुण्यातील त्रिशुंड गणपतीला शुंडा तीन असल्या तरी मुख मात्र एकच आहे.....*
*१३. सिंहावर बसलेला गणेश...*
*बजौरा (हिमाचल प्रदेश) येथील गणेशमूर्ती दोन सिंहाच्या बैठकीवर बसलेली असून तिला ४ हात असून त्याच्या हातात अनुक्रमे परशु, एक अस्पष्ट वस्तू, दात आणि मोदकाचे पूर्णपात्र अशा वस्तू आहेत.’....*
*(साभार : मासिक ‘वेध गणेशाचा’)*
*स्रोत: आंतरजाल, सनातन प्रभात...*
*🔸दुर्वा माहात्म्य.🔸*
*एकदा यमाच्या नगरात एक मोठा उत्सव होता. त्यास देव-गंधर्वादी लोक आले होते... त्याप्रसंगी तिलोत्तमा नृत्य करीत असता तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला. लाजून दरबारातून तो उठून चालला असता अग्निचा लोळ उसळला व त्यातून 'अनल' नावाचा एक भयंकर राक्षस निर्माण झाला.....*
*त्या राक्षसाच्या भयंकर आवाजाने त्रिभुवन हादरून गेले आणि डोळ्यातील अग्नीने पृथ्वी जळू लागली. दशदिशा जाळीत, पोळीत, जे काही सापडेल त्याचं भक्षण तो करु लागला.....*
*हा प्रकार पाहून सर्वजण भयभित झाले. त्या राक्षसाच्या त्रासातून वाचण्यासाठी देव श्रीगणेशाकडे गेले... त्यांची करुणावाणी ऐकून लहान बालकाच्या रुपात गजानन त्यांच्या समोर आला आणि म्हणाला "मला तुम्ही अनलासुरापुढे नेऊन सोडा....".*
*श्रीगणेशाच्या इच्छेप्रमाणे देवांनी बालगणेशास अनलासुरापुढे नेऊन सोडले. तेथे जाताच छोटा गणेश एकदम पर्वताएवढा महाकाय झाला व त्याने अनलासुराला गिळून आपल्या पोटात टाकले.....*
*त्यामुळे गजाननाच्या पोटात दाह होऊ लागला... तेव्हा इंद्रादी देव त्या बालकाजवळ आले व त्याच्या पोटातील दाह शांत व्हावा म्हणून प्रत्येकाने काहीना काही दिले.....*
*इंद्राने शीतल व अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला, म्हणून 'भालचंद्र' म्हटले जाऊ लागले.....*
*ब्रह्मदेवाने सिद्धी व बुद्धी अशा दोन मानसकन्या निर्माण करुन त्या अर्पण केल्या... विष्णूने आपल्या हातातील थंडगार कमळ दिले, त्यामुळे गणेशास 'पद्मपाणी' म्हटले जाऊ लागले. वरुणाने थंडगार पाण्याचा अभिषेक त्याच्या मस्तकावर केला.....*
*शंकराने सहस्त्रमस्तकांचा नाग अर्पण केला म्हणून गणेशास 'व्यालबद्धोदर' असे नाव प्राप्त झाले.....*
*इतके उपहार मिळूनसुद्धा श्रीगणरायाच्या पोटातील आग काही केल्या थांबेना... तेव्हा तेथे आलेल्या ८०,००० ऋषिंनी प्रत्येक २१ अशा हिरव्यागार दुर्वा श्रीगजाननाच्या मस्तकावर अर्पण केल्या, तेव्हा गजाननाचा दाह कमी झाला.....*
*तेव्हा गजानन म्हणाला, "अनेक उपायांनी माझ्या दाहाचं क्षमन झालं नाही, ते दुर्वांनी झालं, म्हणूनच मी या दुर्वांना प्रिय मानतो... मला त्या अर्पण करणा-याला पुण्य लाभेल".....*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸श्रीगणेश उत्तरपूजा🔸*
*अगदी सोप्पी उत्तर पूजा...*
*ज्या दिवशी श्रीगणेशांचे विसर्जन करायचे असेल, त्या दिवशी विसर्जन समयी शुचिर्भूत होऊन कपाळाला गंध/अष्टगंध लावावे... आसनावर बसावे. उजव्या हातावर पळीभर पाणी व अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा....,*
*'श्रीगणेश प्रीत्यर्थ पंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये....'*
*असे म्हणून पाणी ताम्हानात सोडावे...*
*यानंतर श्रीगणेशांची पंचोपचारांनी पूजा करावी...*
*श्रीगणेशाय नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।*
*(गंध लावावे...)*
*श्रीगणेशायय नमः । पुष्पाणी समर्पयामि ।*
*(फुले वहावीत...)*
*श्रीगणेशाय नमः । धूपं समर्पयामि ।*
*(उदबत्ती ओवाळावी...)*
*श्रीगणेशाय नमः । दीपं समर्पयामि ।*
*(नीरांजन ओवाळावे...)*
*श्रीगणेशाय नमः । नैवेद्यं समर्पयामि ।*
*(नैवेद्य अर्पण करावा...)*
*विडा, दक्षिणा यावर पळीने पाणी सोडावे. नारळ अर्पण करावा... सर्वांनी आरती करावी. सर्व कुटुंबियांच्या कल्याणासाठी मागणे मागावे, सर्वांनी श्रीगणेशांना नमस्कार करावा...*
*या नंतर 'अनेन उत्तरपूजनेन श्रीगणेश देवतः प्रीयताम् न मम्। असे म्हणून ताम्हानात उदक सोडावे.....*
*यानंतर हातात अक्षता घेऊन म्हणावे,*
*यांतु देवगणाः सर्वे पुजामादाय पार्थिवीम् । इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनाय च ॥*
*असे म्हणून देवावर अक्षता वहाव्यात व मूर्ती पाटासह (आसनासह) किंचित सरकवावी.....*
*यानंतर आपल्या प्रथेप्रमाणे जयजयकारात विसर्जन करावे.....*
*🔸वर्धापनदिन (जैन संवत्सरी.)🔸*
*🟣२८/०८/२०२५- जैन संवत्सरी...🙏*
*संवत्सरी ( संस्कृत : संवत्सरी ) (अर्थ- वार्षिक दिवस) हा जैन धर्माच्या श्वेतांबर पंथातील पर्युषणाचा शेवटचा दिवस आहे... हे जैन दिनदर्शिकेतील भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पंचमीला दरवर्षी येते, जे ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असते.....*
*क्षमायाचना...*
*या दिवशी, जैन जाणूनबुजून किंवा नकळत दुखावल्याबद्दल किंवा लहानपणाबद्दल सर्व प्राणिमात्रांची क्षमा मागतात... दरवर्षी या दिवशी "संवत्सरी प्रतिक्रमण " नावाची तपश्चर्या केली जाते...*
*प्रतिक्रमणानंतर, जैन लोक " मिछमि दुक्कगम ", "खमौ सा", "उत्तम क्षमा" किंवा "खमत खमना" असे म्हणत जगातील सर्व प्राणी, मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून क्षमा मागतात.....*
*संवत्सरी हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे... संवत्सरा म्हणजे वैदिक साहित्यात (जसे की ऋग्वेद आणि इतर प्राचीन ग्रंथ) "वर्ष" होय. अशा प्रकारे, संवत्सरी चा शब्दशः अर्थ आहे... दरवर्षी येणारा दिवस.....*
*प्रथेनुसार, लोक या दिवशी त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना मिछमी दुक्कडम म्हणतात... संवत्सरीनंतर कोणतेही भांडण पुढे जात नाही.....*
*जैन दिनदर्शिकेतील (श्नेतांबर पंथातील) सर्वात पवित्र दिवस असल्याने अनेक जैन या दिवशी पूर्ण उपवास करतात.....*
*संवत्सरी श्नेदंबरा पंथात आणि क्षमावाणी आणि दिगंबर पंथात साजरी केली जाते, परंतु या दोन दिवसांमध्ये फारसा फरक नाही... दोन्ही दिवशी माफी मागतो.....*
*एक फरक म्हणजे संवत्सरी आणि क्षमावाणी वेगवेगळ्या दिवशी असतात... दोन्ही पर्युषणाच्या शेवटच्या दिवशी होतात, परंतु श्वेतांबरा आणि दिगंबरा पंथांमध्ये पर्युषण वेगवेगळ्या दिवशी सुरू होते आणि वेगवेगळ्या काळात टिकते.....*
*म्हणून श्वेतांबर जैन भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पंचमीला संवत्सरी साजरी करतात आणि दिगंबरा जैन अश्विन कृष्ण महिन्याच्या पहिल्या दिवशी क्षमावाणी साजरी करतात.....*
*स्रोत: आंतरजाल, विकिपीडिया...*
*🔸सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज.🔸*
*🟣२८/०८/२०२५- श्री मच्छिंद्रनाथ जयंती..*
श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " म्हणून प्रसिद्द असलेल्या नऊ मुलांनी जगदुद्धारार्थ अवतार धारण केले... त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि "श्री मत्स्येंद्र" हे नामकरण धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात.....*
जगात सर्वात प्रथम श्री शंकारकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकविला ते स्वामी मछिंद्रनाथ होत... विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मछिंद्रनाथ होय. शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही. तर देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती, भिल्लीणीच्या रुपात असतांना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय, असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मछिंद्रनाथ होय.....*
महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालविण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषीश्रेष्ठ, स्वामी मछिंद्रनाथ होत.....*
महादेव शंकरानंतर ज्या कोणास संजीवनी विद्येचे केवळ ज्ञान होते एवढेच नव्हे, तर त्या अत्यंत कठीण विद्येत पारंगत होते आणि स्वतःवर तसेच मीननाथांवर संजीवनी विद्येचा वापर करून स्वतःचे परमश्रेष्ठत्व सिद्ध करणारे तपोनिष्ठ विभूतिमत्व म्हणजे स्वामी मछिंद्रनाथ होत... गोरक्षासारखा अवधूत स्थिती प्राप्त झालेल्या श्रेष्ठतम शिष्याच्या तपोमयतेचा अहंकार, अत्यंत साध्या लपंडावाच्या खेळाने आव्हान देऊन, त्रिखंडात क्षणात संचार करणाऱ्या गोरक्षनाथांनाही पुनःश्च शरण आणणारे जगातले पाहिले शिवशिष्य स्वामी मछिन्द्रानाथ होय. (मछिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला, त्यात त्यांनी पृथ्वी, तेज, आप, वायू व आकाश अशी रुपे धारण केली व तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणीत चाळुन काढले पण त्यांना स्वामी मछिंद्रनाथ सापडले नाहीत).....*
नवनाथांपैकि आद्यगुरु बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजिवन समाधी मंदिर मायंबा (सावरगाव) या ठिकाणी नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो.....
श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांची जन्मकथा...
एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले... हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला.....*
उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे... हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले.....*
मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला... पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाहि दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला.....*
बालपण...*
मच्छिंद्रनाथांचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा पिता कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला... तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या पित्यास इतका राग आला की, तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच प्रकारे ताडन करून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला.....
त्या बोलण्याने मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरलासे पाहून त्याची दृष्टि चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला... तेथे त्याने बारा वर्षै तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला. इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व आदिनाथानची स्तुति करताच आदिनाथाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन आदिनाथ अरण्यात गेले . त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास आदिनाथाचा रुकारहि मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले.....*
*स्रोत: विकिपीडिया...*
*🔹२८/०८/२०२५- संत गजानन महाराज पुण्यतिथी...*
शेगाव (बुलढाणा जिल्हा), महाराष्ट्र, भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा (संप्रदाय) चे भारतीय गुरू होते... त्यांना भगवान दत्तात्रेय आणि भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो. त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही परंतु त्याचे 20 वर्षांचे एक तरुण म्हणून शेगाव येथे त्याचे प्रथम परिचित स्वरूप फेब्रुवारी 1878 रोजी आहे. तिथी त्याच्या शिष्यांनी समाधी दिन म्हणून दर्शविली (ऋषी पंचमी) ज्या दिवशी शिष्य श्री पुण्यतिथी उत्सवाचे अनुसरण करतात. त्याच्या पहिल्या हजेरीची तारीख देखील 'प्रगट दिन सोहळा' म्हणून ओळखल्या जाणार्या शुभ दिवसा म्हणून चिन्हांकित केली जाते.....*
गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री. दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्याचे नाव "श्री गजानन विजय असे आहे... या ग्रंथातील उल्लेखानुसार महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि इतिहास वाचायला मिळतो.....*
श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती... त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी १८ वर्षाचे गजानन महाराज शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले असे मानले जाते. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"*
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती... पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे.....*
महाराजांची अशी मूर्ती एखाद्याच्या घरात लगबगीने घुसत असे, किंवा अंगणात, ओसरीवर मुक्काम ठोकीत असे... मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावा, अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.....*
महाराजांना झुणका भाकरीसोबतच शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे... कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे, तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.....*
मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले, की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात... मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.....*
*स्रोत: आंतरजाल, विकिपीडिया...*
*🔸परमपूज्य कलावती आई.🔸*
*🟣२८/०८/२०२५- कलावतीदेवी जयंती, बेळगाव .
*कुळीं कन्या पुत्र, होती जे सात्विक |*
*तयाचा हरिख, वाटे देवा |*
*पहाताती वाट, स्वर्गीचे पूर्वज|*
*वंशी भक्तराज, व्हावा कोणी ||*
*पुत्र नसलिया, कन्या तरी व्हावी |*
*हरीगुण गाई सर्वकाळ |*
*तुका म्हणे पितरे, आशिर्वाद देती |*
*कल्याण इच्छिती, निरंतर ||*
सुसंस्कृत व सात्त्विक गुणांनी युक्त असे कल्याणपूरकरांचे घराणे... या घराण्यात श्रीमत् परमहंस शिवरामस्वामी या नांवाचे एक थोर सत्पुरुष होवून गेले. ते बालसंन्यासी असून गोकर्णानजिक असलेल्या बंकीकोड्ल या गांवचे मठाधिकारी होते. स्वामींचे चुलत बंधू दोघे असून थोरल्याचे नांव शामराव व धाकट्याचे नांव शांतमूर्ती. शामरावांना बाबुराव हे एकुलते एक. बाबुराव वयात आल्यावर त्यांचे वडील निवर्तले. शांतमूर्तींना संतती नसल्याने ते बाबुरावांना पुत्रवत मानीत. बाबुरावांचा स्वभाव अगदी साधा मनमिळाऊ व गोड होता. बाबुरावांचे लग्न शांतमूर्तींनी केले. त्यांच्या पत्नीचे नांव सीताबाई. या पण सत्यनिष्ठ, परोपकारी, मेहनती, गुणी व पतिनिष्ठ होत्या. लग्नानंतर आठ वर्षे त्यांना संतती झाली नसल्याने इ.स. १९०७ मधील श्रावण मासात सुपुत्र प्राप्तीच्या अपेक्षेने बाबुरावांनी सहस्त्रलिंगार्चनास आरंभ केला. त्याची समाप्ती दुर्गाष्टमीच्या दिवशी झाली. त्याच रात्री "मी तुझ्या वंशात जन्म घेणार आहे" असा देवीने बाबुरावांना दृष्टांत दिला. पुढे त्यांना लवकरच याची प्रचिती आली.....*
शुद्ध बीजा पोटी | फळे रसाळ गोमटी | या तुकारामोक्ती प्रमाणे इ.स. १९०८ मधल्या ऋषिपंचमीच्या शुभदिवशी ब्राम्ही मुहूर्तावर या जोडप्याला एक कन्यारत्न झाले... तिचे बाराव्या दिवशी "रुक्माबाई" असे नांव ठेविले. बाबुराव लाडिकतेने तिला "बाळ" म्हणून हाक मारीत. बाळ हे बाबुरावांचे पहिलेच अपत्य असल्याने मुलगा व्हावा या त्यांच्या इच्छेला धक्काच बसला, त्यामुळे ती उभयता प्रथम नाराज झाली. पण पुढे बाळचे एकेक अलौकिक गुण जस जसे प्रगट होवू लागले तसेच तिची बुद्धिमत्ता, आहार, विहार व इतर वागणे जेव्हा सर्वांपेक्षा निराळे दिसू लागले तेव्हा मात्र देवीने दिलेल्या दृष्टांताची त्यांना सत्यता पटली आणि त्यांची पूर्वीची दृष्टी साफ बदलून गेली. त्यावर अशा बाळाला जन्म देण्याचे भाग्य आपणास लाभले याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले तसेच आत्तापर्यंत आपण केलेल्या तपश्चर्येला संतुष्ट होवून देवाने आपणास असले दुर्लभ फळ दिले. आपण खरोखरच मोठे भाग्यवान आहोत असे त्यांना वाटले.....*
*बाबुरावांच्या घरी रोज संध्याकाळी भजनाचा परिपाठ होता... त्यामुळे लहानपणापासूनच बाळचे सहज हरिभजनाकडे चित्त वेधले होते. तिची नेहमी उदास वृत्ति होती. तिची खेळण्याची तर्हाम वेगळीच होती. तिला राम, कृष्ण, दत्त, गणपती, मारुती या मूर्ती आवडत. कृष्णाची मूर्त तिला अत्यंत आवडे. त्यामुळे मध्यभागी कृष्णाची मूर्त ठेवून दोन्ही बाजूस इतर मूर्ती ठेवी. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच बाळ मराठी, कानडी व गुजराथी भाषेतील भजने म्हणे. तिची स्थिर बसण्याची पद्धत, आवाजातील मधुरता आणि शांतवृत्तीने भजन म्हणण्याची पद्धत पाहून श्रोतेमंडळी तिचे कौतुक करीत. ज्या ज्या दिवशी बाबुराव बाळला समुद्रकिनार्यानवर घेवून जात त्या त्या वेळी ती एकेक पिंडी तयार करून त्यांना मुर्डेश्वर, योगेश्वर अशी नांवे ठेवी आणि बरोबर नेलेला खावू, पिंडीला नैवेद्य दाखवून लोकांना व वडिलांना देवून आपण सेवन करी.....*
वयाच्या सातव्या वर्षी बाळला स्वामी पूर्णानंद यांचे दर्शन घडले. बाळचे निर्भेळ प्रेम, तैलबुद्धी, उत्साही वृत्ति, उत्कट पुण्याची हाव,शिस्तीची आवड, तपश्चर्येची चिकाटी या सर्व सद्-गुणांचे स्वामींनी निरिक्षण केलेले असल्याने परत आपल्या गांवी जातेवेळी त्यांनी बाळला गोपाळकृष्णाची मूर्ति दिली आणि काही गार्हाणे सांगावयाचे ते याच्यापुढे सांग... हाच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करील असे सांगितले आणि बाबुरावांकडे वळून....,*
"ही तुमची मुलगी सामान्य नसून खास लोकोद्धारार्थच अवतरली आहे... ही वयाच्या अठरा वर्षांपर्यंतच तुमच्यामध्ये राहील. त्यानंतर विरक्त होऊन सर्वांपासून दूर जाईल. आपल्या रसाळ वाणीने सार्यार जगाला आपलेसे करील." असे सांगितले. तेव्हापासून श्री पूर्णानंदांकडून मिळालेला तो गोपाळकृष्ण हेच रुक्माबाईंचे सर्वस्व होऊन बसले. वयाच्या सात ते चौदा वर्षापर्यंत तिला झालेला लाभ म्हणजे गोकर्णासारख्या पवित्र क्षेत्रात वास, घरातील नियमीत भजन, वरचेवर संतांचा सहवास, सद्-बोधश्रवण, श्रीगोपाळकृष्णाच्या मूर्तीच्या व ग्रंथांच्या रुपाने मिळालेला श्री पूर्णानंद स्वामींचा आशिर्वाद, कार्तिक -माघ - वैशाख स्नाने, सद्ग्रंथांची पारायणे व अध्ययन आणि बाबुरावांचे शुद्ध प्रेम याबद्दल थोडा विचार केला तर खास जगदोद्धाराचे कार्य करवून घेण्यासाठीच परमेश्वराने ही सर्व पूर्वतयारी तिच्या कडून करवून घेतली होती.....*
ईश्वरी संकेतानुसार पंधराव्या वर्षी रुक्माबाईंचा विवाह दक्षिण अर्काटांतील कडलूर जिह्यात राहणारे पोलीस इन्स्पेक्टर श्री. राजगोपाल मल्लापूर यांचे बरोबर झाला... बाबुरावांच्या सूचने प्रमाणे व-हाडी मंडळी गोकर्णाहून आपल्या गांवी जात असता हुबळीला उतरुन श्रीसिद्धारूढ स्वामींच्या दर्शनार्थ गेली. त्या समयी नवदांपत्यावर स्वामींचा अनुग्रह झाला. त्या क्षणापासून रुक्माबाई हरीध्यानात अधिकच निमग्न राहू लागल्या. त्यांचे सासरचे वागणे, स्त्रियांना अत्यंत आदर्शभूत असेच होते. रुक्माबाईंना वयाच्या सतराव्या वर्षी एक मुलगा झाला आणि एकोणीसाव्या वर्षी, दुसरा मुलगा आठ महिन्याचा पोटात असताना, एकाएकी ह्रदयक्रिया बंद पडून त्यांच्या पतिदेवांचे देहावसान झाले. या महान आपत्तीचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. पतीचे धर्मराज्य संपले. तेव्हा आता आपण जगून काहीच उपयोग नाही म्हणून हताश ह्रदयाने घराजवळच्या मैदानातील एका विहिरीत त्या आत्महत्या करायला प्रवृत्त झाल्या. त्यासमयी तेथे एक जटाधारी पुरुष प्रगट झाले व, "माई! थांब! थांब! आत्महत्या करण्याकरिता तू जन्माला आली नाहीस! जीव देणाऱ्यांना वाचविण्यासाठी तुझा जन्म आहे. तुझ्या हातून जगदोद्धाराचे थोर कार्य व्हावयाचे आहे. लवकर हुबळीला जा. सिद्धारूढस्वामींच्या कृपेने तू सुखरूप होशील." इतके सांगून ते अदृश्य झाले.....*
त्या क्षणापासून दु:खाने व्याकूळ झालेल्या रुक्माबाईंचे मन एकदम शांत झाले... घरी आल्यावर त्यांनी घरातील सर्व सामानसुमान शिपाई लोकांना व गोरगरीबांना वाटून दिले. देव, देव्हारा, पूजेची उपकरणी व त्यावर एकशे आठ रुपये दक्षिणा ठेवून भटजींच्या स्वाधीन केले. पुढे बाबुरावांनी त्यांना गोकर्णाला बोलावून आणले. एका महिन्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला. पुढे दोन महिन्यांनी बाबुरावांनाहि देवाज्ञा झाली. त्यामुळे रुक्माबाईंच्या मनाच्या औदासिन्यात अधिकच भर पडली. पुढे एका महिन्यानंतर कोणालाहि न कळत एका वस्त्रानिशी त्या हुबळीला सिद्धारूढ स्वामींच्या मठाला गेल्या.....*
स्वामींचे जेव्हा प्रथम दर्शन घडले, तेव्हा ते रुक्माबाईंना उद्देशून म्हणाले, "आलीस! तुझीच मी वाट पहात होतो!" पुढे स्वामींच्या आज्ञेनुसार त्या मठात राहून सेवा करू लागल्या... रुक्माबाईंची त्यावेळची तपश्चर्या खरोखरच असामान्य होती. त्यांचे नेसायचे एकच एक लुगडे होते. आंघोळीच्या आधी त्याचा अर्धा भाग त्या धुवुन वाळवीत आणि आंघोळ केल्यावर तो भाग नेसून, दुसरा अर्धा भाग धुवून वाळवून तो त्या नेसीत असत. त्या पोत्यावर निजत आणि उशीला वीट घेत असत. त्यांच्या जीभेवर नेहमी "ॐ नमःशिवाय" हा मंत्र सारखा घोळत असावयाचा. आपण होऊन कोणाजवळही त्या बोलत नसत. त्यांचे आहाराकडे तर मुळीच लक्ष नसे. यदृच्छेने कोणी केळी, पोहे इ. वस्तु आणून दिल्यास ते त्या खात. नाहीतर नुसत्या पाण्यावर देखील आठ आठ दिवस त्या रहात असत. मात्र रोजच्या सेवेत त्या किंचितही कसूर होवू देत नसत. इतकेच नव्हे तर अत्यंत उत्साहाने पडेल ती इतर सेवाहि त्या करीत असत. त्यांनी निरभिमानपणाने व अत्यंत आपुलकीने केलेल्या सेवेने स्वामी सिद्धारूढ संतुष्ट झाले.....*
पुढे म्हणजे इ.सन १९२८ च्या दसर्याभच्या दिवशी, स्वामींनी रुक्माबाईंच्यावर कृपावृष्टी करून, त्यांना "कलावतीदेवी" हे नांव ठेविले आणि "थोडे निरुपण कर" असे सांगितले. तेव्हा स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून, "नाम संकीर्तन साधन पै सोपे" या अभंगावर कलावतीदेवींनी अडीच तास निरुपण केले... त्यांच्या प्रासादिक वाणीतून निघालेले गोड निरुपण ऐकून सारी श्रोतेमंडळी मुग्ध होऊन गेली. पुढे इ.सन १९२९ साली श्रावणातील पहिल्या सोमवारी, स्वामींनी देवींना जवळ बोलावून घेतले आणि, "मी लवकरच समाधी घेणार आहे. त्यानंतर साधनाभ्यासात तू सहा महिने घालीव. त्यावर बारा वर्षेपर्यंत कीर्तनाच्या निमित्ताने गावोगांवी जाऊन हरीनामाचा व विश्वप्रेमाचा प्रसार कर. मी सदा सर्वकाळ तुझ्याजवळ आहेच. तू अगदी निर्भय रहा." असे सांगून साधनाभ्यासाबद्दल त्यांना काही विशेष सूचना दिल्या. सात दिवसांनी म्हणजे श्रावण कृष्णप्रतिपदेला, पहाटे चार वाजता स्वामींनी महासमाधी घेतली. त्यानंतर गुरुआज्ञेनुसार देवींनी, हुबळीतच एके ठिकाणी खोली घेऊन साधनाभ्यासास सुरुवात केली. दिवसातून फक्त एकदाच एक वाटीभर दूधभात आणि दोन वाट्या पाणी हा त्यांचा आहार होता! त्या झोपायला चटई आणि उशाला वीट घेत असत. थंड पाण्याची आंघोळ करीत. तांब्याऐवजी मातीचा मोगा वापरीत. रॉकेलच्या डब्यात पाणी भरून ठेवीत आणि स्वामींनी सांगितलेल्या साधनाभ्यासाच्या व्यतिरिक्त राहिलेला वेळ, त्या नाम:स्मरणात घालवीत असत.....*
सहा महिन्यानंतर देवी महाशिवरात्रीच्या उत्सवाला मठात गेल्या... तेव्हा उत्सवाला आलेल्या रावबहाद्दूर एच. नारायणराव, प्रिन्सिपॉल, यांच्या पत्नीने त्यांना आपल्या घरी बेंगळूरला येण्याबद्दल अत्यंत आग्रह केला. ही सद्गुरुंचीच प्रेरणा असे मानून देवी त्यांच्याबरोबर बेंगळूरला गेल्या. तेथे प्रथम महिला मंडळात त्यांचे कीर्तन करण्याचे ठरले. त्यावेळी तेथील सेक्रेटरींनी देवींना इतर कीर्तनकाराप्रमाणे समजून, "तुमची बिदागी काय?" असा त्यांना प्रश्न केला. तेव्हा, "तुम्ही प्रेमाने व एकचित्ताने बसून माझे बोबडे बोल ऐकून घेणे आणि त्यात काही चुकले तर त्याबद्दल मला क्षमा करणे, हीच माझी बिदागी आहे!" असे त्यांनी उत्तर दिले.....*
तेव्हापासून अशाप्रकारे स्वाभाविकरित्या आलेली निमंत्रणे स्वीकारून त्यांचा कीर्तनार्थ गावोगांवी संचार सुरु झाला... परमेश्वर सर्वांचा मायबाप असून आम्हा लेकरांना त्याचे प्रेम संपादन करण्याचा सारखाच हक्क आहे. अशी समतेची शिकवण त्यांच्याकडून सर्वांना दिली गेली. निसर्ग हाच माणसाचा महान गुरु आहे. त्याची सेवा करणे हाच श्रेष्ठ मानवी धर्म आहे, याची प्रचीति त्या वारंवार आणून देत असल्याने, कलावतीदेवी या संसारी माणसांच्या संत बनल्या, यात नवल नाही.....*
ही त्यांची तपश्चर्या चालली असता अनेक नाट्यमय घटना प्रत्यहि घडून आल्या... पण सद्-गुरुंनी आश्वासन दिल्याप्रमाणे त्या त्या वेळीकधी प्रत्यक्षपणे सिद्धप्पा हुबळीकर, गुरूनाथ हुबळीकर अशा नांवाने तर कधी अप्रत्यक्षपणे येऊन संकटातून मुक्त केल्याचा पदोपदी त्यांना अनुभव आला. पुढे १९४२ साली, देवी रामनवमीच्या उत्सवानिमित्त बेळगांवला आल्या त्यावेळी गुरुकृपेने देवींची बारा वर्षाची किर्तन सेवेची तपश्चर्या पूर्ण झाली होती. त्याच सुमारास सांताक्रूझचे एम्.शिवराव यांना, बेळगांव येथे अनगोळ माळावर एखादी जागा घेऊन ती देवींना अर्पण करण्याबद्दल सिद्धारूढ महाराजांचा दृष्टांत झाला. त्यावर ते बेळगांवला आले आणि दृष्टांताची वार्ता त्यांनी देवींपुढे निवेदन केली. तेव्हा, "तुमच्याप्रमाणे मलाहि दृष्टांत झाल्याशिवाय मी तुमचे म्हणणे मान्य करु शकत नाही" असे देवींनी त्यांना सांगितले. त्यावर त्याच रात्री, "शिवरावांनी देवू केलेली जागा तू घे आणि त्याठिकाणी राहून साधूमास्तरांना मी दिलेले वचन, तू पूर्ण कर" असा सिद्धारूढस्वामींनी कलावतीदेवींना दृष्टांत दिला. त्यांनतर देवींनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे शिवरावांनी दिलेल्या देणगीचा स्वीकार केला. तत्पूर्वी किंवा तद्नंतर कित्येकवेळा कोणी शेत, मळा, घर, इस्टेट, देऊळ इ. देवू केले तरी देवींनी त्याचा स्वीकार केला नाही.....*
देवींनी त्या जागेत एक आश्रम बांधला. त्याचेच नांव "श्रीहरिमंदीर" होय... त्या आश्रमात देवींनी प्रथम वास्तव्य केले. बारा वर्षाच्या प्रवासात संग्रहीत केलेली संतांची पदे व अभंग एकत्र करून त्याचे परमार्थ-मार्गप्रदीप या नांवाचे पुस्तक छापविले आणि त्यात आखल्याप्रमाणे, बाळगोपाळ व मायबहिणींना भजनाचा पाठ देण्याचे काम हाती घेतले. शेकडो भगिनींना भजन शिकवून भजनाचे महत्व पटवून दिले. जेव्हा भजनापासून अवीट अशा आनंदाचा अनुभव येवू लागला आणि दिवसेंदिवस मनाचे समाधान वाढू लागले तेव्हा,भजन म्हणजे केवळ टाळकुटणे असून हे रिकामटेकड्यांचे काम आहे, असे ज्यांना ज्यांना वाटत होते त्या सर्वांचा गैरसमज साफ दूर झाला. त्यावर, भजन हे संसाराच्या उद्वेगाने तापलेल्या ह्रदयाला शांत करणारे सोपे, सुगम व सर्वोत्कृष्ट असे एक साधन आहे याची त्यांना खात्री पटली.....*
परमपूज्य कलावतीदेवींच्याकडे दु:खनिरसनार्थ येणार्याय लोकामध्ये सर्व धर्माचे व पंथाचे लोक होते... त्यात बोहारी जमातीतील लोकांचा पण भरणा होता. हे लोक अगदि मागासलेले; आठ आठ दिवस ते आंघोळी वाचून राहत असत. त्यांना स्वच्छता, नीटनेटकेपणा व भजनाचे महत्व पटवून दिले. या लोकांनीच प्रथम परमपूज्य कलावतीदेवींना "आई" या नांवाने संबोधण्यास सुरवात केली. श्रीहरिमंदिरात हरीनामाशिवाय दुसरा विषय चालत नाही. हे श्रीहरिमंदिर म्हणजे जणु आनंदभुवनच होय. याठिकाणी कितीहि त्रासलेला अगर गांजलेला मनुष्य आला, तरी त्याच्या मनातील संसाराचा उद्वेग नाहीसा होवून तो आनंदित होऊन जातो.....*
परमपूज्य आईंनी रचलेली काही पदे पण आहेत... ती अतिशय गोड व प्रसादपूर्ण अशी आहेत. त्या पदांना कला, कलावंत, कलिमलहारी, कलिमलदहन, कलिमलहरण, रुक्मिणी, रखुमाईवर अशा मुद्रिका आहेत. आईंचे वर्तन इतके शुद्ध होते की त्यांना तपकीर, पान किंवा सुपारी नव्हे तर चहा कॉफीचे देखील व्यसन नव्हते. त्यांनी इ.स. १९३० पासून १९४२ पर्यंत कीर्तनद्वारा व त्यानंतर भजनद्वारा विश्वप्रेमाचा प्रसार करण्यासाठी आपला देह चंदनाप्रमाणे अहोरात्र झिजविला. या आमच्या प्रेमयोगिनीने जनास केवळ उपदेशच केला असे नसून, तो प्रथम, प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यांनी कोणीहि जिव्हाळ्याचे मनुष्य संरक्षणासाठी जवळ नसताना कसलीच भीति न बाळगता ऐन तारुण्यामध्ये वयाच्या वीसाव्या वर्षापासून बत्तीस वर्षापर्यंत निरनिराळ्या प्रांतात बस, नाव, आगबोट, आगगाडी, विमान यामधून त्यांनी एकट्यांनीच कसा प्रवास केला असेल, हे एक हरीच जाणे! परमेश्वररूप सद्-गुरुंवर अढळ श्रद्धा ठेवणार्यांयचे तो पावलोपावली कसे रक्षण करतो, याचे "कलावती आई" हे एक चालते बोलते उदाहरण आहेत.....*
परमपूज्य आईंनी ०८ फेब्रुवारी १९७८ म्हणजे माघ शुद्ध प्रतिपदेला महासमाधी घेतली... त्यांची समाधी बेळगांव मधील अनगोळ भागात श्रीहरिमंदीर या ठिकाणी आहे.....*
*आंतरजाल...*
स्त्री रूपातील गणेश – विनायकी/ गणेशी...
गणेशोत्सव, विनायकी पूजन आणि सामाजिक समतेचा तांत्रिक वारसा
गणेश चतुर्थीचा सण आपण सामाजिक एकतेचा उत्सव म्हणून साजरा करतो. परंतु शाक्त तंत्र परंपरेत गणपतीच्या स्त्री रूपाची, म्हणजेच विनायकीची पूजा केली जात होती, हे अनेकांना माहीत नसते. ही परंपरा सामाजिक समता आणि स्त्री-पुरुष एकतेचा संदेश देणारी होती. मात्र, कालांतराने सनातनी विचारसरणीमुळे ती मागे पडली.
विनायकी: शक्तीस्वरूप गणेश
शाक्त तंत्रातील ग्रंथ, जसे कुलार्णव तंत्र आणि तंत्रसार, गणपतीच्या स्त्री रूपाला विनायकी किंवा गणेशी म्हणतात. गजमुखी आणि चतुर्भुज असलेली विनायकी सर्जनशीलता आणि शक्तीचे प्रतीक आहे. तांत्रिक साधनेत तिची पूजा प्रारंभी केली जाते, ज्यामुळे साधकाला बाह्य आणि आंतरिक अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. ही पूजा पुरुष (चैतन्य) व स्त्री (ऊर्जा) यामध्ये स्त्री शक्तीला केंद्रस्थानी ठेवते आणि शिव-शक्तीच्या एकत्वावर आधारित आहे.
प्रख्यात विचारवंत आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील यांनी भारतीय संस्कृतीतील अब्राह्मणी परंपरांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मते, कुलार्णव तंत्रातील कौलाचार जाती-वर्ण व्यवस्थेला आव्हान देणारा होता. विनायकी पूजनासारख्या प्रथा स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत होत्या. कॉम्रेड शरद पाटील यांनी तंत्र परंपरेला सामाजिक समता आणि जातीअंताच्या दृष्टिकोनातून विश्लेषित केले. डॉ. अशोक राणा यांनीही आपल्या मातृदेवतांच्या संदर्भातील लेखनात तंत्र परंपरांमधील विनायकी देवतेचा इतिहास मांडला आहे.
तंत्रातील पूजा पद्धतींनी सर्वांना समान संधी दिली आणि सामाजिक भेदभावांना विरोध केला.
सनातनी विचारांचा प्रभाव आणि तंत्राचा ऱ्हास
मध्ययुगात आणि त्यानंतरच्या काळात सनातनी विचारसरणीने तंत्र परंपरांना बाजूला सारले. कौलाचार आणि विनायकी पूजनासारख्या अब्राह्मणी प्रथांना अशुद्ध किंवा गूढ ठरवून त्यांचा प्रभाव कमी करण्यात आला. यामागील कारणे खालीलप्रमाणे:
1. सनातनी विचारांनी वर्ण-जातीच्या कठोर नियमांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे तंत्रातील समतावादी दृष्टिकोनाला विरोध झाला.
2. तंत्रातील स्त्री-केंद्रित पूजा, जसे विनायकी किंवा काली, यांना पुरुषप्रधान व्यवस्थेने दाबले.
3. तंत्रातील पंचमकारांचा प्रतीकात्मक अर्थ बाजूला ठेवून त्यांना अश्लील ठरवले गेले.
4. राजेशाही आणि वसाहतवादी काळात तंत्र परंपरांना अंधश्रद्धा आणि अघोरी गूढ ठरवून त्यांचे दमन झाले, ज्यामुळे सनातनी विचारांना अधिक बळ मिळाले.
यामुळे विनायकीसारख्या पूजा प्रथा जवळपास लुप्त झाल्या. आज गणेशोत्सवात आपण गणपतीची पुरुष रूपातच पूजा करतो, आणि विनायकीचा वारसा विसरला गेला आहे.
गणेशोत्सव हा धार्मिक सणाबरोबरच सामाजिक एकतेचा उत्सव आहे. खरी भक्ती जाती, वर्ण आणि लिंगाच्या पलीकडे जाते. कॉम्रेड शरद पाटील यांनी शाक्त पंथाबद्दल मांडणी करताना त्याचा मार्क्सवाद, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांशी मेळ घालणारा दृष्टिकोन भारतीय संस्कृतीतील समतेची ताकद दाखवतो.
*समर्थ गणेश (अर्थात रामदास स्वामींनी त्यांच्या समर्थ शब्दांत वर्णिलेला गणपती)*
- दादासाहेब दापोलीकर
आपल्या संस्कृतीमध्ये 'सगळे देव सारखे' असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. परंतु तरीही काही देवांचा प्रभाव जनमनावर इतर देवांपेक्षा अधिक आहे. असे का? याला उत्तर नाही. आमचे विष्णु भगवान भक्तांना तारण्यासाठी अनेक अवतार घेऊन पृथ्वीवर येतात. आमचा कैलास राणा संहारक शिव तर दुष्टांचा, शत्रूचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आमची युद्धगर्जनाच मुळी 'हर हर महादेव' अशी आहे! हिंदुस्थानमध्ये जर कुठल्या एका देवाची सर्वाधिक मंदिरे असतील तर ती या महादेवांची! त्या खालोखाल बहुधा मारुतीची देवळी असावीत! ब्रह्मदेव तर सर्वात ज्येष्ठ देव! आणि इंद्र महाराज तर देवाधिराज! हे सर्व देव आपापल्या ठिकाणी महान आहेत. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. परंतु जर कुठल्या एका देवाचा दहा दहा दिवस उत्सव साजरा होत असेल तर तो म्हणजे विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती! गणपतीने लोकांच्या मनावर इतकं गारुड केलं आहे की एकेकाळी फक्त महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा हा गणेशोत्सव आता हिंदुस्थानच्या अनेक राज्यांमध्ये प्रसिद्ध होत चालला आहे. गणपती हा विघ्ननाशक तसेच विद्येचा अधिपती आहे. संकटापासून मुक्ती आणि विद्यार्जन या दोन्ही गोष्टी प्रत्येकाला हव्या असतात. कदाचित त्यामुळेच ही देवता भक्तमंडळींमध्ये अधिक सुप्रसिद्ध असावी. गणपतीचे दुसरे वैशिष्ट्य असे की गणपती हा 'डिझायनर्स गाॅड' आहे! अनेक पद्धतीने गणपतीचे चित्र किंवा शिल्प निर्माण करता येते! पट्टीचा चित्रकार नसलेला मनुष्यसुद्धा गणपतीचे रेखाचित्र सहज काढू शकतो!
हिंदुस्थानमध्येच नव्हे तर जगामध्ये अनेक ठिकाणी गणपतीची मंदिरे आणि मूर्त्या आहेत. आणि प्रत्येक मूर्ती वेगळी! प्रत्येक चित्र वेगळे! या भगवंताच्या रूपामध्ये जेवढे वैविध्य आहे तेवढे दुसऱ्या कुठल्याही देवाच्या रूपामध्ये नाही! ज्याला जशी कल्पना सुचेल तसा त्याने गणपती रेखाटावा! कसलेही बंधन नाही! कसलाही नियम नाही. लोकांच्या कल्पनाविलासाला वाव देणारा असा हा कलांचा अधिपती! गणपती जसा चित्रकारांना, शिल्पकारांना भावतो तसाच तो लेखक आणि कवींनाही साद घालतो! मराठीमध्ये गणपतीवर जेवढी गीते आणि आरत्या लिहिल्या गेल्या आहेत तेवढ्या दुसऱ्या कोणत्याही देवावर लिहिल्या गेल्या नसाव्यात!
साधुसंतही या गणेशाकर्षणाला अपवाद नाहीत! माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रारंभाचे गणेश स्तवन करताना, "ओम नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।" अशा प्रासादिक आणि श्रीमंत शब्दांमध्ये गणरायांचं वर्णन केलं आहे. माऊलींचे गणेश स्तवन हा वेगळ्या लेखाचा एक विषय होईल. आज आपण दासबोधामधील समर्थांच्या गणेश स्तवनाची चर्चा करणार आहोत.
रामदास स्वामींची शब्द श्रीमंती इतकी अफाट आहे की काही विचारू नका! आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती जो गणपती, त्याचे, कुठल्याही शुभकार्यारंभी वंदन करतात. त्यानुसार समर्थांनी ग्रंथराज दासबोधाची रचना करताना गणपतीचं जे काही अलौकिक वर्णन केलं आहे त्याला मराठी वाङ्मयामध्ये तुलना नाही! या स्तवनांच्या दशकामध्ये ग्रंथारंभ लक्षणांचा पहिला समास संपला की दुसऱ्या समासामध्ये समर्थांनी गणनायकाला नुसतं वंदनच केलं आहे असं नव्हे तर त्यांच्या खास रामदासी शैलीमध्ये या देवतेचं वर्णन केलं आहे. रामदास स्वामींची भाषा ही नेहमीच केवळ भक्तीरसपूर्ण नव्हे तर शक्तीरस म्हणजे वीररसपूर्ण राहिली आहे. भक्तीबरोबरच बलोपासनेचे महत्त्व जर कुठल्या एका संताने महाराष्ट्राला सांगितले असेल तर ते म्हणजे रामदास स्वामींनी. गणेशस्तवनाच्या या समासामध्ये रामदास स्वामींचे हे वीररसपूर्ण शब्द आपल्याला संमोहित करतात. पहिल्याच ओवीमध्ये समर्थ म्हणतात,
ओम नमोजी गणनायका । सर्व सिद्धी फळदायका ।
अज्ञानभ्रांतीछेदका। बोधरूपा। । १।।
'सर्व सिद्धी फळदायक' म्हणतानाच रामदास स्वामी त्याला अज्ञान आणि भ्रम यांचा छेद म्हणजे नाश करणारा असं म्हणतात.
तिसऱ्या ओवीमध्ये स्वामी लिहितात-
तुझिये कृपेचेनि बळे । वितुळती भ्रांतीची पडळे ।
आणी विश्वभक्षके काळे । दास्यत्व कीजे ।।३।।
हे गजानना, तुझ्या कृपेने भ्रमाचे म्हणजे अज्ञानाचे ढग वितळून जातात आणि सर्वभक्षी असा जो काळ तोही दास्यत्व करू लागतो.
येतां कृपेची निज उडी। विघ्ने कांपती बापुडी।
होऊन जाती देशोधडी। नाममात्रे ।।४।।
तुझ्या कृपेच्या नुसत्या उडीने सारी संकटे चळचळा कापू लागतात आणि अक्षरशः देशोधडीस लागतात!
या तीन ओव्यांमधील छेदक, वितळणे, भक्षक, उडी मारणे, विघ्नांचे भीतीने कापणे अशी सारी वीररसपूर्ण शब्दसंपदा समर्थांनी हेतू पुरस्सर, वीर रसाचा पुरस्कार करण्यासाठी वापरली आहे हे निश्चित. गणपती ही केवळ विद्येची देवता आहे असे नव्हे तर तो विघ्ननाशक आहे. विघ्नांचा, शत्रूंचा नाश करण्यासाठी त्याच्याकडे त्याची स्वतःची बलशाली सोंड आहे, पाश आहे, परशु आहे! एरवी अत्यंत सात्विक, राजस आणि साजिरे दिसणारे गणरायाचे हे रूप प्रसंग आला तर महासंहारक होऊ शकते. मध्ययुगामध्ये गणेशाची उपासना, लोकांनी विद्येची देवता यापेक्षा, किंवा कमीत कमी त्याबरोबरच, शौर्याची देवता म्हणून करावी असे समर्थांच्या मनात असावे हे पुढील श्लोकावरून लक्षात येते.
म्हणोनी नामे विघ्नहर । आम्हा अनाथांचे माहेर।
आदिकरूनी हरिहर। अमर वंदिती ।।५।।
कुठे सहसा वाचण्यात किंवा ऐकण्यात न येणारी अशी एक त्या काळाला अनुरूप गोष्ट समर्थ गणपती संदर्भात लिहितात. ते गणेशाला 'अनाथांचे माहेर' म्हणत आहेत. यावनी आक्रमणांनी, अत्याचारांनी गांजलेल्या अनाथ जनतेला गणेशाचा आधार कसा वाटतो? तर त्यांना ते आपले माहेर वाटते! त्याकाळी किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत होत असलेल्या सासुरवासाला कंटाळलेल्या स्त्रीला माहेरचा जसा आधार वाटतो तसाच आधार लोकांना गणेशाचा वाटतो. अशी एक सुंदर संकल्पना रामदास स्वामींनी येथे मांडली आहे...
त्यानंतर स्वामींनी गणेशाच्या रूपाचं जे काही अद्वितीय वर्णन केले आहे ते त्यांच्या शब्दात ऐकलेलं बरं.
जयाचे आठविता ध्यान । वाटे परम समाधान ।
नेत्री रिघोनिया मन । पांगुळे सर्वांगी।। ६ ।।
तुझे रूप आठवले की इतकं समाधान होतं की, मन केवळ सर्व शरिरातून निघून नयनांमध्ये येऊन बसतं! सर्व शक्ती नेत्रांठायी एकवटल्यामुळे इतर शरीर जवळजवळ पांगळं होतं!
सगुण रुपाची ठेव । महा लावण्य लाघव ।
नृत्य करिता सकळ देव । तटस्थ होती।।७।।
तुझे सगुण रूप म्हणजे मूर्तस्वरूप इतके सुंदर आहे, तुझे नृत्य इतके लाघवी आहे की सारे देव मंत्रमुग्ध होतात!
गणपतीच्या रूपाची इतकी भरभरून प्रशंसा करणारे समर्थ हे बहुधा एकमेव!
सर्वकाळ मदोन्मत्त। सदा आनंदे डुल्लत।
हरुषें निर्भर मुदित । सुप्रसन्न वदनु।। ८।।
वास्तविक पाहता, मानवी शरिरावर हत्तीचे मस्तक जोडून जन्मास आलेले गणराज, मानवी सौंदर्याच्या व्याख्येमध्ये कुठे बसतात हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. रामदास स्वामींना मात्र सदा सर्वकाळ गजराजाप्रमाणे मदोन्मत असलेला, हत्तीसारखाच आनंदाने डोलत असलेला भगवान गजानन याचे वदन हे अत्यंत सुप्रसन्न भासते! हे वदन जरी सुप्रसन्न असले तरी ते कसे भव्य दिव्य आहे ते पुढील ओवीमध्ये समर्थ अत्यंत सुयोग्य शब्दामध्ये वर्णितात.
भव्यरूप वितंड। भीममूर्ति माहा प्रचंड।
विस्तीर्ण मस्तकीं उदंड। सिंधूर चर्चिला । । १०।।
हे गणपती, तुझे गजरूप हे भव्यदिव्य, भीमकाय आणि महाप्रचंड आहे! हत्तीच्या त्या विशाल भालप्रदेशावर भरपूर शेंदूर चर्चिलेला आहे.
नाना सुगंध परिमळें। थबथबा गळती गंडस्थळें ।
तेथें आलीं षट्पदकुळें। झुंकारशब्दें ।। ११। ।
एखादी गोष्ट किंवा क्रिया कशी आहे हे वाचकांना सहजच कळावे म्हणून समर्थ अतिशय समर्पक शब्द वापरतात. गणपतीचे गंडस्थळ कसे गळत आहे तर 'थबथबा' गळत आहे! एखाद्या मधाच्या पोळ्यातून अत्यंत मधुर असा मध ठिबकत राहावा तसा गणपतीच्या गंडस्थळामधून सुगंधित असा तो मद पाझरत आहे. त्याच्या सुवासाने मधमाशा आणि भुंगे गुंजारव करत तेथे आलेले आहेत.
मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्षणा मंदसत्वी । । १२। ।
तुझी कधी वक्राकृती तर कधी सरळ अशी सतत हलत असलेली सोंड अत्यंत विलोभनीय दिसते. तुझे अनोखे गंडस्थळ आणि थोडासा लांब आणि खालच्या बाजूला निमुळता होत गेलेला असा तुझा (सोंडे)खालचा ओठ यांतून मंद मंद रित्या मदस्त्राव होत आहे.
समर्थांचे निरीक्षण किती सूक्ष्म होते याचा, या दोन ओळी म्हणजे उत्तम नमुना आहे. काही ठिकाणी या ओवीचे थोडे वेगळे अर्थ दिले आहेत. एके ठिकाणी म्हटले आहे की, "तुझी वक्राकार सोंड सरळ झाली की शोभून दिसते. गंडस्थळ आणि खालचा ओठ हे शोभायामान दिसत आहेत. गंडस्थळामधून तीक्ष्ण मदस्त्राव सतत ठिबकत असतो." आमच्या मते हे असे नाही. गंडस्थळ म्हणजे सोंडेच्या प्रारंभापासून ते वरच्या बाजूला, डोळ्यांच्या वरती आणि पुढे माहुत जेथे अंकुश टोचतो तेथपर्यंतचा भाग. हत्ती जेव्हा मदोन्मत्त होतो तेव्हा या गंडस्थळामधून जो मद स्रवतो तो दोन्ही बाजूने खाली ओघळून जमिनीवर पडत राहतो आणि काही थोडा मद हत्तीच्या खालच्या ओठापर्यंत जातो आणि तेथून त्या निमुळत्या (तीक्ष्ण)ओठातूनही त्याचे थेंब थेंब खाली पडत राहतात.
चौदा विद्यांचा गोसांवी। हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ||१३||
चौदा विद्यांचा अधिपती असा तू! तुझे डोळे किती बरे इवले आहेत आणि ते तू सतत हलवत आहेस! तुझ्या कानांच्या अत्यंत पातळ असलेल्या पाळ्या फड-फड असा आवाज करत, तू सतत हलवत आहेस.
इथे जिज्ञासू मंडळींना असा प्रश्न पडेल की रामदास स्वामींनी पुढच्या तीन ओळींमध्ये गणपतीच्या अवयवांचे आणि हालचालींचे वर्णन केले आहे. परंतु पहिल्या ओळीमध्ये 'चौदा विद्यांचा गोसावी' म्हणजेच स्वामी असे लिहिले आहे. वरवर पाहता पहिली ओळ आणि पुढच्या तीन ओळी यांचा तसा अर्थार्थी संबंध दिसत नाही. परंतु रामदास स्वामींनी हे काही नुसतेच यमक जुळावे म्हणून लिहिलेले नसणार. या दोन गोष्टी एकत्रित लिहिण्यामागे त्यांची काहीतरी विचार भूमिका असली पाहिजे.
'डोळे आणि कान ही पंचेंद्रियांपैकी दोन महत्त्वाची ज्ञानेन्द्रिये आहेत. त्यांचा सतत वापर करून आपल्या सभोवती असलेल्या परिस्थितीमधून जे काही ज्ञान आत्मसात करता येईल ते सतत करत राहावे.' असा संदेश तर समर्थांना या ओवीमधून द्यायचा नसेल?
रत्नखचित मुगुटीं झळाळ। नाना सुरंग फांकती कीळ ।
कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ।। १४।।
या ओवीमध्ये समर्थांनी गणपतीच्या अलंकारांचे वर्णन केले आहे. रत्नजडित असा झळाळणारा मुकुट केवळ अवर्णनीय! त्यामधील रत्नांमधून विविध रंगांचे अत्यंत सुंदर आणि तेजस्वी असा प्रकाश बाहेर पडत आहेत. ज्यांच्यावर अत्यंत तेजस्वी अशी नील रत्ने जडवली आहेत असे कुंडल कानामध्ये तळपत आहेत.
वरवर पाहता हे अलंकारांचे वर्णन असले तरी समर्थांना येथे अभिप्रेत आहे तो ज्ञानाचा प्रकाश! या आधीच्या ओवीमध्ये आपल्या ज्ञानेन्द्रियांद्वारे ज्ञानार्जन केले की आपण समृद्ध होतो आणि त्या ज्ञानाचा प्रकाश इतरत्र पसरतो. ज्ञानाचा आणि मस्तिष्काचा संबंध आहे. म्हणून स्वामींनी शिरावर धारण केल्या जाणाऱ्या अलंकारांचे रूपक येथे वापरले आहे.
दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट ।
तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ।। १५।।
तुझे पांढरे शुभ्र दात घट्ट म्हणजे मजबूत आहेत! त्यावरती सुवर्णाची रत्नखचित कडी बसवलेली आहेत. या सोन्याच्या कड्यांखाली छोटी छोटी सोन्याची पाने लावलेली आहेत आणि ती रत्नप्रकाशात तळपत आहेत.
समर्थांनी गणपतीचे वर्णन करताना शिरापासून सुरुवात केली आहे आणि ते हळूहळू शरीराच्या अधोभागांकडे वर्णन करीत येत आहेत. गणपती म्हटले की दातांचे वर्णन हवेच! गणपती हा चौदा विद्यांचा अधिपती आहे. एकदा ज्ञान अर्जित करून झाले की ते दानसुद्धा केले पाहिजे. सर्वाधिक ज्ञानदान हे मुखावाटे होते. वाणीच्या सिद्धतेमध्ये दातांचे मोठे योगदान आहे. म्हणून दातांची म्हणजेच पर्यायाने ज्ञानदानाची श्रीमंती समर्थांनी सुवर्णालंकारांच्या रूपकाने येथे विशद केली आहे.
लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद ।
क्षुद्र घंटिका मंद मंद| वाजती झणत्कारें ।। १६। ।
चतुर्भुज लंबोदर। कासे कासिला पितांबर ।
फडके दोंदिचा फणिवर| धुधूकार टाकी ।।१७। ।
डोलवी मस्तक जिव्हा लाळी। घालून बैसला वेटाळी।
उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे । । १८ ।।
हे लंबोदरा, तुझे पोट हे थुलथुलीत असून ते हलत आहे. कमरेला कमरपट्ट्याच्या ऐवजी साक्षात नागराज वेढा घालून बसलेले आहेत! (कमरेत बांधलेल्या) छोट्या छोट्या घंटिका किणकिण असा मंजुळ आवाज करत आहेत. .
या दोन्ही ओव्यांचे अनेक ग्रंथांमध्ये केवळ शब्दावर आधारित असे अर्थ विशद केलेले आहेत. आमच्या मते समर्थांना या गणपतीवर्णनाद्वारे शब्दांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे तत्त्वज्ञान अपेक्षित आहे.
पितांबर धारण केलेला चतुर्भुज लंबोदर गजानन! त्याच्या उदरावर कमरेला वेढून बसलेला सर्पराज फूत्कार टाकत आहे!
त्याच्या चार भुजा जणू चार पुरुषार्थांचे प्रतीक आहेत. समर्थांनी पितांबरासाठी पिवळा रंग हा मुद्दामहून योजिला आहे. पीत वर्ण हा सूर्याचे म्हणजे तेजाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे पिवळा रंग हा आनंद ,आशावाद, ऊर्जा आणि बुद्धीचेही प्रतीक आहे. गणपतीचे मोठे पोट हे ऐश्वर्याचे आणि समृद्धीचे लक्षण आहे. त्याचबरोबर ते प्रापंचिक गुंतागुंतीचे प्रतीक आहे. ऐश्वर्य, समृद्धी, संसार या सगळ्या गोष्टी कितीही चांगल्या भासल्या तरी काळरुपी सर्प त्यांना वेढून बसलेला आहे आणि एक दिवस तो या सर्व ऐहिक गोष्टींना गिळून टाकणार आहे. त्यामुळे त्यामध्ये अधिक अडकू नका हा संदेश त्यातून आपल्याला मिळतो.
या सर्पाचे अत्यंत भीतीदायक असे वर्णन समर्थांनी केले आहे. वेटोळे घालून बसलेला हा काळरुपी सर्प नेमका नाभीजवळ म्हणजे उद्गगमबिंदूजवळच फणा काढून बसला आहे! जिभल्या चाटत, मस्तक डोलवत आजूबाजूला टकमक पाहत आहे. काळ आपल्यावर लक्ष ठेवून आहे. त्याने आपल्याला वेढलेले आहे आणि तो आपल्याला कधी मटकावून टाकेल त्याचा काहीही भरोसा नाही.
नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां ।
रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे । । १९ ।।
शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ ।
येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति । । २०। ।
गणपतीच्या गळ्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या पुष्पमाळा रुळत आहेत त्या कमरेमधील सापापर्यंत पोहोचतील इतक्या लांब आहेत. रत्नजडित हारामधील, केंद्रस्थानी असलेले पदक हृदयाजवळ आले आहे आणि ते अत्यंत विलोभनीय दिसत आहे
एका हातातील परशु हे युद्ध सिद्धतेचे प्रतीक तर दुसऱ्या हातातील कमळ हे शांतीचे प्रतीक! तिसऱ्या हातात असलेला अंकुश हा दुर्जनांवर सज्जनांचे प्राबल्य, अज्ञानावर ज्ञानाचे प्रभुत्व यांचे प्रतीक तर चौथ्या हाताने मोदक हे सौख्य, भरभराट, विपुलतेचे प्रतीक!
नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी| उपांग हुंकारे ।। २१ ।।
स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण।
साजिरी मूर्ति सुलक्षण। लावण्यखाणी ।। २२।।
गणपती विद्येचा जसा अधिपती आहे तसा चौसष्ट कलांचाही अधिपती आहे. तो स्वतः एक श्रेष्ठ नट आहे आणि नर्तकही! टाळ मृदंगाच्या तालावर तो विविध प्रकारचे नृत्य करू शकतो. सतराव्या - अठराव्या शतकापर्यंत यवनांनी जो धुमाकूळ घातला होता त्याने सर्वसामान्य रयतेच्या जीवनाचे पार वाटोळे करून सोडले होते. प्राण, मालमत्ता वाचवण्याचीच मारामारी, तर कला आणि विद्या कशा शिकायच्या? तर त्यासाठी गणपतीची उपासना आवश्यक आहे हे लोकांना कळावे. म्हणून समर्थ प्रयत्नरत असायचे. गणपती जसा विविध संकटांना तोंड देतानाच विद्या आणि कलांचा उपासक बनला त्याप्रमाणेच लोकांनीही विद्या आणि कला आत्मसात कराव्यात हा यामागचा हेतू!
गणपतीचे पोट मोठे, त्याचे शीर हत्तीचे. त्यामुळे हा देव सुस्त वगैरे असावा असे कुणाला वाटू शकते. समर्थ या तार्किक शक्यतेचे निराकरण करताना सांगतात की, गणपतीला एकाही क्षणाची स्थिरता मंजूर नसते! त्याच्या सतत हालचाली सुरू असतात. चपळतेमध्ये तर तो सर्वात पुढे आहे. त्याचे रुपडेसुद्धा अत्यंत साजिरे आहे! जणू काही लावण्याची खाणीच!!
रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी । । २३ ।।
गणपतीच्या पायातली नुपुरे तो हालचाल करीत असताना, चालत असताना किंवा नर्तन करीत असताना रुणझुण रुणझुण अशी मंजुळपणे वाजत आहेत. दंडातल्या वाक्याही मधुर ध्वनी करत आहेत. आणि दोन्ही पायात असलेल्या घागऱ्यासुद्धा किणकिणत आहेत. या घागऱ्यांमुळे गजवदनाची दोन्ही पावले सुद्धा अत्यंत मनोहर दिसत आहेत!
गणपतीचे व्यक्तिमत्व जसे प्रभावी आणि सामर्थ्यवान आहे त्याच्या हातामध्ये असलेल्या शस्त्र, पुष्प, खाद्य इत्यादी वस्तू ज्याप्रमाणे त्याच्या हेतूचे आकलन करत असतात, त्याचप्रमाणे त्याच्या शरीरावरील अलंकारही त्याच्या कलासक्ततेबद्दल आपल्याला अवगत करतात!
ईश्वरसभेसी आली शोभा। दिव्यांबरांची फांकली प्रभा।
साहित्यविशईं सुल्लभा। अष्टनायका होती ।। २४।।
गणपतीच्या उपस्थितीमुळे देवसभेससुद्धा म्हणजे शंकराच्या सभेस शोभा आलेली आहे! त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा तर काही अफाटच! गणपतीच्या कृपेमुळे तेथील अष्टनायिका साहित्य, कला, नृत्य आदि विषयात प्रवीण झालेल्या आहेत. (काही ठिकाणी याचा अर्थ असा दिला आहे की गणपतीला सर्व प्रकारचे साहित्य सिद्ध करून देण्यासाठी अष्टनायिका तयार आहेत. परंतु हा तितकासा योग्य वाटत नाही. अष्टनायिकांचा संबंध, साहित्य, कला, नृत्य इत्यादीशी येतो. त्यामुळे या अष्टनायिका गणपतीला शंकराच्या दरबारात कुठलं साहित्य सिद्ध करून देत असतील असे वाटत नाही. तसेच काही ठिकाणी अष्टनायिका गणपतीला साहित्य निर्मितीसाठी मदत करतात असेही लिहिले आहे. तेही सयुक्तिक वाटत नाही.)
ऐसा सर्वांगे सुंदरु। सकळ विद्यांचा आगरु ।
त्यासी माझा नमस्कारु। साष्टांग भावें ।। २५।।
ध्यान गणेशाचें वर्णितां। मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां। वोळे सरस्वती ।।२६।।
तर अशा या सर्वांग सुंदर आणि सर्व विद्यांचे निधान असलेल्या गणपतीला माझा साष्टांग नमस्कार.
गणपतीची महती इतकी मोठी आहे की त्याचे वर्णन ज्ञानपूर्वक ऐकले तर एखाद्या मतीभ्रष्टाला, वेड्याला सुद्धा बुद्धी प्राप्त होईल, त्याच्या डोक्यात बुद्धीचा प्रकाश पडेल. गजाननाचे गुणवर्णन ऐकून प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होईल.
जयासि ब्रह्मादिक वंदिती। तेथें मानव बापुडे किती।
असो प्राणी मंदमती। तेहीं गणेश चिंतावा ।। २७।।
ज्या दैवताला प्रत्यक्ष ब्रम्हदेवादि देव वंदन करतात, तेथे मनुष्याची बापड्याची काय स्थिती? असो. ज्यांची बुद्धी मंद आहे, जे अल्पमती आहेत त्यांनीही गणेशाचे चिंतन केल्यामुळे त्यांना लाभ होईल.
जे मूर्ख अवलक्षण। जे कां हीणाहूनि हीण।
तेचि होती दक्ष प्रविण। सर्वविशईं ।। २८।।
जे अत्यंत मूर्ख आहेत, अनेक विषयांमध्ये ज्यांना विशेष गती नाही एवढेच नव्हे तर जे त्या त्या विषयांमध्ये ज्ञानाच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवर आहेत ते सर्वजण गणेश आराधना करून या सर्व विषयांमध्ये अत्यंत प्रवीण होतील.
ऐसा जो परम समर्थ। पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजनस्वार्थ। कलौ चंडीविनायकौ ।। २९।।
असा हा गणराज अत्यंत सामर्थ्यशाली आहे. त्याच्या भजनी लागणाऱ्यांचे, त्याची भक्ती करणाऱ्यांचे सारे मनोरथ तो पूर्ण करतो हे प्रचितीसह सांगता येईल. 'कलौ चंडी विनायकौ!' हे वचन तर प्रसिद्धच आहे. याचा अर्थ कलियुगामध्ये चंडी आणि विनायक ही दोन दैवते जागृत आहेत. त्यांच्या भजनी लागून त्यांची भक्ती करणे हे भक्तांना हितप्रद आहे ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे.
ऐसा गणेश मंगळमूर्ती। तो म्यां स्तविला यथामति ।
वांछा धरूनि चित्तीं । परमार्थाची ।। ३०।।
तर अशा या मंगलमूर्ती गणेशाचे, परमार्थ हेतूने मी माझ्या बुद्धीप्रमाणे स्तवन केले आहे!
गणेश स्तवन हे परमार्थ हेतूने केले आहे असे समर्थांनी म्हटले आहे. याचाच अर्थ 'हे गणेशस्तवन केवळ एखाद्या शुभकार्याच्या आरंभी करायचे असते' केवळ म्हणून केलेले नसून या स्तवनाच्या ओव्यांमधूनही लोकांनी काहीतरी बोध घ्यावा असेच रामदास स्वामींच्या मनात असणार आहे.
'सुखकर्ता दु:खहर्ता' या रामदास स्वामींनी रचलेल्या गणपतीच्या अप्रतिम आरतीला जसा अग्र-आरतीचा मान 'स्वयमेवमृगेंद्रता' या न्यायाने मिळाला आहे, त्याचप्रमाणे दासबोधातील या गणेश स्तवनाला अग्र-स्तवन म्हणणे उचितच ठरेल!
दादासाहेब दापोलीकर
९९६७८४०००५
विनायक ते गणेश…
गणपती ही बुद्धीची देवता. गणपती हा विघ्नहर्ता. गणपती म्हटलं म्हणजे डोळ्या समोर येतो व्यासांनी दिलेली कामगिरी पार पाडणारा कुशल लेखणीक. कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणेशपूजन केल्याशिवाय कार्य निर्विघ्न पार पडत नाही म्हणून गणपती हा विघ्नहर्ता. गणपतीला महाराष्ट्रामध्ये आज सर्वात अधिक पूजल्या जाणाऱ्या दैवतां मध्ये गणलं जातं. अश्या या गणेशाची प्राचीनता ग्रांथीक आधारावर काय सिद्ध करते ते पाहू…
ऋग्वेदात गणपतीचा तथाकथित उल्लेख पुढीलप्रमाणे येतो –
गणानाम् त्वा गणपतिं हवामहे, कविं कवीनामुपश्रवस्तम्,
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: शृण्वन्न्तिभिं: सीद सादनम् ।
( हे ब्रह्मणस्पते, तू गणांचा अधिपती आहेस. कविंचा कवी आहेस, तुझ्याजवळ विपुल अन्न आहे, तू ज्येष्ठ आहेस. यज्ञस्थळी येऊन आसनस्थ हो असे आम्ही तुला आवाहन करतो.)
वरील ऋचेमध्ये ब्रह्मणस्पतीला गणांचा अधिपती म्हणजे प्रमुख अर्थात गणपती असे संबोधले आहे ब्रम्हणस्पती म्हणजे आजचा गणपती नव्हे. इंद्र हा देवाधीपती. इंद्राला सुद्धा वेदांमध्ये गणपतीनावाने संबोधल्या गेले आहे. रुद्र हे वेदां मधील शिवाचे रूप म्हणजे हा सुद्धा गणांचा अधीपती म्हणजे गणपतीच होय. गणपत्यथर्वशीर्षात गणपतीला ‘शिवसुत’ म्हटले आहे.
गणपती हा यक्षस्वरूप असावा. त्याचे मोठे पोट, प्राण्याचा चेहरा व त्याचे विनायक म्हणजेच “विघ्नकर्त्याचे” स्वरूप या गोष्टीला पुष्टी जोडतात. जुन्या काळापासूनच यक्षाच्या दोन प्रकारच्या स्वरूपाची कल्पना केली गेली होती. एक म्हणजे रूप अत्यंत सुंदर, अद्भुत सामर्थ्यवान व लोकांचे कल्याण करणारे असे मानले जात असे. तर दुसऱ्या रूपात बटबटीत डोळे पसरलेले तोंड आखूड मांड्या,सुटलेले पोट अशा भयंकर देहाची कल्पना केली जात असे. गणपतीला पाहता तोही काहीसा याच स्वरूपाचा भासतो.
विनायक म्हणजे काय तर विनायकांचे स्वरूप मानव गृह्यसूत्र या ग्रंथात सांगितले आहे की “ विनायकांनी ग्रासलेल्या मनुष्याची मनस्थिती आणि कार्यकलाप यात विसंगती निर्माण होते. त्यांना वाईट स्वप्न येऊ लागतात. मनुष्य भय व तसेच आश्चर्यकारक स्वप्न पाहू लागतो, कन्यांचा विवाह अववृद्ध होतो. राजकुमारांना राज्यप्राप्ती होत नाही. मातेच्या समोर पुत्रांचा मृत्यू होतो.”
गजानन आणि विनायक यांच्या उत्पत्ती बद्दल आणखी एक कथा वराहपुराणात आली आहे ती अशी…जनांत पापकार्ये निर्विघ्न होऊ लागल्यामुळे देवचिंतित झाले व रुद्राकडे गेले. रुद्र पार्वतीकडे पाहून हसला व त्याचे आकाश तत्वाचा प्रतिनिधी म्हणून एक पुरुष प्रगट झाला. पार्वती त्याच्या सौंदर्याला न्याहाळू लागली. त्यामुळे शिव चिडला व त्याने त्या पुरुषाला ‘तुला हत्तीचे तोंड असेल सापांचे जाणवे घालशील व तुझे पोट सुटलेले राहील.’ असा शाप दिला. याचवेळी कित्येक विनायकांची उत्पत्ती झाली.पुढे ब्रह्मदेवाने रतबदली केल्यामुळे हा गजानन शंकराच्या कृपेने सर्व विनायकांचा अधिपती झाला. गणेशा संबंधिच्या कथा कोणत्याही असल्या तरी त्या एकच गोष्ट निर्देशीत करतात ते म्हणजे गणेश हा ‘अयोनीज’ आहे. प्रतिष्ठित आणि उच्च वर्गात त्याला सामावण्यासाठी त्याला पुढे शिवगणात शामिल केले गेले असावे.
याज्ञवल्क्य या महत्वाच्या स्मृतीत असे म्हटले आहे की “ रुद्र आणि ब्रह्मा यांनी कर्मात विघ्न निर्माण करण्यासाठी गणांच्या अधिपत्याचे ठायी नियुक्ती केली” याच ग्रंथात म्हटले आहे की “ ज्यास विनायकाने जास्त उपसर्ग केला आहे तो स्वप्नात पाण्याच्या मोठ्या प्रवाहात आपण वाहत जात आहोत किंवा बुडत आहोत असे पाहतो, ज्याच्या मस्तकाचे मुंडन केले आहे अशा पुरुषास लाल - काळी वस्त्रे नेसलेल्या वा पांघरलेल्या मनुष्यास पाहतो, कच्चे मांस भक्षण करणाऱ्या गृध्रादी पक्षावर आणि व्याघ्रादी पशुवर आरवन केलेले पाहतो, चांडाल आदी यांनी परिवेष्टित असून आपण जात आहोत आणि आपल्या मागून शत्रू येत आहेत असे पाहतो. चित्त नेहमी विक्षिप्त असणे कोणत्याही कामात यश न येणे, कोणतेच कारण नसताना मन उदास होणे , राजपुत्रास राज्य न मिळणे कुमारीस पती न मिळणे, अपत्य न होणे, गर्भधारणा न होणे, अध्ययन व अर्थज्ञान असताही आचार्य प्राप्त न होणे, योग्यता असूनही विज्ञान व्यापारात लाभ न होणे, शेतकऱ्यास फल प्राप्त न होने इत्यादी कष्ट होतात.”
या उल्लेखांवरून गणेशाची म्हणजेच विनायकां संबंधीची सुरुवातीची लोकधारणा काय होती हे कळते. या विनायकांना कोणत्याही कामा पहिले पूजल्यास ते अडथळे आणत नाहीत अशी लोकसमजूत होती. गणेशाला आज सुद्धा आपण कोणत्याही शुभ कार्या पहिले त्याचे पूजन करतो. त्याचे आवाहन करतो. महाभारताच्या अनुशासन पर्वात गणेश्वर आणि विनायकांचा उल्लेख आला आहे. त्यात म्हटलंय की हे विनायक मानवांवर लक्ष ठेवतात आणि ते सर्वीकडे असतात. ते सामान्यां मधील दृष्ट प्रवृत्तीचा नाश करतात.
अशीच एक कल्पना टोटेम संबंधीची आहे. आदिम समाजात टोळ्यांची विशिष्ट चिन्हे असत. त्यास कुलचिन्हे म्हटले तरी चालेल.ती चिन्हे पशुपक्षी, वृक्ष, हत्यारे इत्यादींची होती. गणांनाही अशी चिन्हे असत. गणांची हत्ती, वाघ, अस्वल, वानर, कोल्हा, कुत्रा, वड, पिंपळ, मानवी कवटी इत्यादी चिन्हे होती. यापैकी “ गजानुयायी लोक हत्तीचे रूपडे करून आपल्या तोंडावर घालीत व अशारितीने आपले गजानुयायित्व लोकांसमोर प्रगट करीत असे मला वाटले ” हे लो. अणे यांनी आपल्या ‘गणपतिदेवता’ या शोधनिबंधात नमूद करतात.
मध्यकाळातील स्कंदपुराणात(काशिखंड) वानर, सिंह व हत्ती अशा त्रिमूखी आणि पंचमुखी विनायकांचा उल्लेख आला आहे.गणेश पुराण व मुद्गलपुराण अशी दोन स्वतंत्र उपपुराणे महाराष्ट्रातील गणेश भक्तांनी रचली आहेत. महाराष्ट्रातील गणेशाला आलेले महत्व पाहता येथे इ. स. च्या 9-10 व्या शतकात स्वतंत्र असा गाणपत्य संप्रदाय अस्तित्वात असावा असे दिसते. मुद्गलपुराण,ब्रह्म पुराण, ब्रह्मांड पुराण यात गणेशाचे महत्व याच काळात सांगितल्या गेले.
इ. स. पूर्व काळापासून ते 8-9 व्या शतका पर्यंत गणेशाची उपासना व त्याचे महत्व कसे वाढत गेले हे अनेक पुरातात्विक पुराव्यावरून पाहता येते. गणेश उपासनेमागील अनेक सामाजिक धारणा होत्या. समाजात असलेले यक्षांचे महत्व, विनायकांची सामान्यां मध्ये असलेली भीती ही गणेशाला सर्व स्तरात मान्यता प्राप्त होण्यास कारणीभूत झाली. आज गणेशाची होणारी पूजा ही एका अर्थाने विनायकांच्या शांतीसाठीचीच पूजा आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही...
©पृथ्वीराज धवड
.
श्रींचा जन्मोत्सवा ची कथा..
....गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे आज भाद्रपद शुद्ध ०३ तृतिया आज आपण श्री मयुरेश्वर अवताराविषियी जाणून घेणार आहोत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशीचा मोरया चा जन्मोत्सव याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत अष्टविनायकांमध्ये एक श्री गिरिजात्मज लेण्याद्री यांचे प्राकट्य देखील याच कथेमध्ये आहे..
त्रेतायुगातील कथा आहे, मिथीला प्रांतात, गंडकी नामक नगरीत चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत असे परंतु त्याला संतती नव्हती सतत चिंताग्रस्त राजाला ऐके दिवशी महर्षी शौनक भेटले. राजाने महर्षीना आपली व्यथा सांगितली त्यावर महर्षीनी त्यांना सूर्य उपासनेचा उपदेश केला. राजा ने पत्नीसह भगवान सूर्यांची कठोर आराधना केली, अखेर भगवान सूर्यांनी त्यांच्या पोटी अंश रूपात जन्म घेण्याचा वर प्रदान केला परंतु भगवान सूर्यांच्या तेजाची इतकी तीव्र उष्णता होती की राणीच्या गर्भाचा असहाय्य दाह होऊ लागला, अखेर राणीने अनिच्छेने समुद्र किनारी गर्भ त्याग केला, परंतु साक्षात सूर्यांचा अंश असल्यामुळे समुद्रानेच गर्भ जगवला त्याचं नाव सिंधू ठेवण्यात आलं, परंतु मातृ संस्कार विरहित जगलेला गर्भ त्यामुळे सिंधू हा क्रूर असुरांप्रमाणे वर्तन करू लागला. ऐके दिवशी सिंधूच्या मनात प्रश्न आला की आपणही इतर असूरांप्रमाणेच तपश्चर्या करून संपूर्ण त्रैलोक्य गिळंकृत करायला हवं त्यानेही सूर्याची घोर तपश्चर्या केली त्यावर प्रसन्न सूर्याने त्याच्या कंठात अमृतकलश स्थापित केला आणि वर दिला, "जोवर हा कलश कंठात असेल तोवर तुझा मृत्यू असंभव असेल". अखेर वरदानावश त्याने त्रैलोक्य विजय केला, त्रिमूर्ती देखील आपले निवासस्थान सोडून त्र्यंबकेश्वर क्षेत्री महर्षी गौतमांच्या आश्रमात राहू लागले. त्र्यंबकेश्वर क्षेत्री निवास करतांना ऐके दिवशी शंकर ध्यान करीत होतो, पार्वतीने कोणाचे ध्यान करतात? असा प्रश्न विचारला त्यावर शंकरांनी पार्वतीला गणेश तत्वज्ञान समजून सांगितले.ॐकार ब्रम्हाचे अलौकिक महात्म्य समजावून घेतल्यावर देवी पार्वतीला गणेश दर्शनाची इच्छा जागृत झाली, तिने शंकरांकडून मंत्रोपदेश घेतला आणि लेण्याद्री क्षेत्री तपश्चर्या केली आणि साक्षात गणेशांना पुत्र रुपात प्राप्त करण्याचा वर मिळवला, दुसरीकडे सर्व देवताही सिंधुच्या अत्याचाराने त्रस्त होऊन भगवान गणेशांना शरण गेल्या, बराच काळ उलटला देवी पार्वती भगवान गणेशांना पुत्र रूपात प्राप्त करण्यासाठी आतुर झाल्या होत्या अखेर त्यांनी पुनः श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा पार्थिव व्रत आरंभ केला, ज्यात रोज एक " मृत्तीकेची नवीन मूर्ती तयार करायची आणी रोज तीचे पुजन करून विसर्जित करायची, असा संपूर्ण एक मासाचा पार्थिव गणेश व्रत केला.
आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला स्वाती नक्षत्रावर, मध्याह्न समयी मोरया लेण्याद्री येथे पार्थिव मूर्तीतून प्रकट झाले म्हणून या ठिकाणी श्री गिरिजात्मज म्हणजे गिरीजीचा पुत्र गिरीजा म्हणजे पार्वती आणि पार्वतीचा पुत्र असणारा तो गिरीजात्मज अशी देखील मूर्ती तिथे स्थापन झाली. पुढे या गणेशाने मयूर म्हणजे मोर हे वाहन धारण केले आणि मयुरेश्वर नाव धारण करून त्याने सिंधुरासुराचा वध केला मयुरेश्वर अवतार प्रयोजनार्थ झाले, अनेक लिला केल्या आणी सिंधू दैत्याचा नाश केला.
आपण आज ज्याला गणेशोत्सव म्हणतो, तो हाच मयुरेश्वर अवताराचा जन्मोत्सव आहे, जो अनेक युगांपासुन गाणपत्य सांप्रदायात व्रत स्वरूपात केला जातो, परंतु स्वातंत्र्य काळात टिळकांनी या व्रताला सार्वजनिक स्वरूप दिले, त्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढत गेली आणी प्रतिपदा ते चतुर्थी असणारा व्रत पुढे चतुर्दशी पर्यंत साजरा होत महाराष्ट्राचा महाउत्सव "गणेशोत्सव" झाला.
- संदर्भ ग्रंथ श्री मुद्गल महापुराण
श्री बल्लाळेश्वर पाली ballaleswara ganpati pali
श्रींचा जन्मोत्सवा ची कथा..
....गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे आज भाद्रपद शुद्ध ०३ तृतिया आज आपण श्री मयुरेश्वर अवताराविषियी जाणून घेणार आहोत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशीचा मोरया चा जन्मोत्सव याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत अष्टविनायकांमध्ये एक श्री गिरिजात्मज लेण्याद्री यांचे प्राकट्य देखील याच कथेमध्ये आहे..
त्रेतायुगातील कथा आहे, मिथीला प्रांतात, गंडकी नामक नगरीत चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत असे परंतु त्याला संतती नव्हती सतत चिंताग्रस्त राजाला ऐके दिवशी महर्षी शौनक भेटले. राजाने महर्षीना आपली व्यथा सांगितली त्यावर महर्षीनी त्यांना सूर्य उपासनेचा उपदेश केला. राजा ने पत्नीसह भगवान सूर्यांची कठोर आराधना केली, अखेर भगवान सूर्यांनी त्यांच्या पोटी अंश रूपात जन्म घेण्याचा वर प्रदान केला परंतु भगवान सूर्यांच्या तेजाची इतकी तीव्र उष्णता होती की राणीच्या गर्भाचा असहाय्य दाह होऊ लागला, अखेर राणीने अनिच्छेने समुद्र किनारी गर्भ त्याग केला, परंतु साक्षात सूर्यांचा अंश असल्यामुळे समुद्रानेच गर्भ जगवला त्याचं नाव सिंधू ठेवण्यात आलं, परंतु मातृ संस्कार विरहित जगलेला गर्भ त्यामुळे सिंधू हा क्रूर असुरांप्रमाणे वर्तन करू लागला. ऐके दिवशी सिंधूच्या मनात प्रश्न आला की आपणही इतर असूरांप्रमाणेच तपश्चर्या करून संपूर्ण त्रैलोक्य गिळंकृत करायला हवं त्यानेही सूर्याची घोर तपश्चर्या केली त्यावर प्रसन्न सूर्याने त्याच्या कंठात अमृतकलश स्थापित केला आणि वर दिला, "जोवर हा कलश कंठात असेल तोवर तुझा मृत्यू असंभव असेल". अखेर वरदानावश त्याने त्रैलोक्य विजय केला, त्रिमूर्ती देखील आपले निवासस्थान सोडून त्र्यंबकेश्वर क्षेत्री महर्षी गौतमांच्या आश्रमात राहू लागले. त्र्यंबकेश्वर क्षेत्री निवास करतांना ऐके दिवशी शंकर ध्यान करीत होतो, पार्वतीने कोणाचे ध्यान करतात? असा प्रश्न विचारला त्यावर शंकरांनी पार्वतीला गणेश तत्वज्ञान समजून सांगितले.ॐकार ब्रम्हाचे अलौकिक महात्म्य समजावून घेतल्यावर देवी पार्वतीला गणेश दर्शनाची इच्छा जागृत झाली, तिने शंकरांकडून मंत्रोपदेश घेतला आणि लेण्याद्री क्षेत्री तपश्चर्या केली आणि साक्षात गणेशांना पुत्र रुपात प्राप्त करण्याचा वर मिळवला, दुसरीकडे सर्व देवताही सिंधुच्या अत्याचाराने त्रस्त होऊन भगवान गणेशांना शरण गेल्या, बराच काळ उलटला देवी पार्वती भगवान गणेशांना पुत्र रूपात प्राप्त करण्यासाठी आतुर झाल्या होत्या अखेर त्यांनी पुनः श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा पार्थिव व्रत आरंभ केला, ज्यात रोज एक " मृत्तीकेची नवीन मूर्ती तयार करायची आणी रोज तीचे पुजन करून विसर्जित करायची, असा संपूर्ण एक मासाचा पार्थिव गणेश व्रत केला.
आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला स्वाती नक्षत्रावर, मध्याह्न समयी मोरया लेण्याद्री येथे पार्थिव मूर्तीतून प्रकट झाले म्हणून या ठिकाणी श्री गिरिजात्मज म्हणजे गिरीजीचा पुत्र गिरीजा म्हणजे पार्वती आणि पार्वतीचा पुत्र असणारा तो गिरीजात्मज अशी देखील मूर्ती तिथे स्थापन झाली. पुढे या गणेशाने मयूर म्हणजे मोर हे वाहन धारण केले आणि मयुरेश्वर नाव धारण करून त्याने सिंधुरासुराचा वध केला मयुरेश्वर अवतार प्रयोजनार्थ झाले, अनेक लिला केल्या आणी सिंधू दैत्याचा नाश केला.
आपण आज ज्याला गणेशोत्सव म्हणतो, तो हाच मयुरेश्वर अवताराचा जन्मोत्सव आहे, जो अनेक युगांपासुन गाणपत्य सांप्रदायात व्रत स्वरूपात केला जातो, परंतु स्वातंत्र्य काळात टिळकांनी या व्रताला सार्वजनिक स्वरूप दिले, त्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढत गेली आणी प्रतिपदा ते चतुर्थी असणारा व्रत पुढे चतुर्दशी पर्यंत साजरा होत महाराष्ट्राचा महाउत्सव "गणेशोत्सव" झाला.
- संदर्भ ग्रंथ श्री मुद्गल महापुराण
श्री बल्लाळेश्वर पाली ballaleswara ganpati pali
गणपती अथर्वशीर्ष हे गणपतीचे उपनिषद मानले जाते. यात गणपतीची तत्त्वस्वरूप व्याख्या, विश्वातील त्यांचे स्थान आणि उपासकाला मिळणारे फळ सांगितले आहे.
---
गणपती अथर्वशीर्ष (मूळ संस्कृत) आणि मराठी भाषांतर
१.
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।
त्वमेव केवलं कर्ताऽसि ।
त्वमेव केवलं धर्ताऽसि ।
त्वमेव केवलं हर्ताऽसि ।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ॥१॥
मराठी अर्थ :
ॐ गणपती, तुला नमस्कार.
तू प्रत्यक्ष तत्त्व आहेस.
फक्त तूच या जगाचा कर्ता आहेस,
फक्त तूच धारक आहेस,
फक्त तूच संहारक आहेस.
हे सर्व ब्रह्म तूच आहेस.
तूच साक्षात आत्मा आहेस.
---
२.
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥२॥
अर्थ :
मी ऋत (नियम व सत्य) बोलतो, सत्य बोलतो.
---
३.
अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् ।
अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् ॥३॥
अर्थ :
हे गणपती, मला रक्षण दे.
वक्ता (बोलणारा), श्रोता (ऐकणारा),
दाता (दान करणारा), धाता (सांभाळ करणारा),
विद्यार्थी आणि शिष्य – या सर्वांचे रक्षण कर.
---
४
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ।
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।
त्वं चत्वारि वाक्पदानि ॥४॥
अर्थ :
हे संपूर्ण जग तुझ्यापासून निर्माण झाले आहे.
ते तुझ्यामुळेच टिकते, तुझ्यातच लय पावते.
तूच भूमी, जल, अग्नी, वायु आणि आकाश आहेस.
तूच वाणीची चार पदे आहेस (परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी).
---
५.
त्वं गुणत्रयातीतः । त्वं अवस्थात्रयातीतः ।
त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः ।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ॥५॥
अर्थ :
तू सत्त्व, रज, तम या गुणांपलीकडे आहेस.
जाग्रत्, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांपलीकडे आहेस.
स्थूल, सूक्ष्म व कारण शरीर या तिन्हींपलीकडे आहेस.
भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळांपलीकडे आहेस.
तू सदैव मूलाधार चक्रात वास करतोस.
---
६.
त्वं शक्तित्रयात्मकः ।
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं
इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं
चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम् ॥६॥
अर्थ :
तूच तीन शक्तींचा (इच्छा, क्रिया, ज्ञान) अधिष्ठाता आहेस.
योगीजन तुला नेहमी ध्यान करतात.
तूच ब्रह्मा, तूच विष्णु, तूच रुद्र आहेस.
तूच इंद्र, अग्नी, वायु, सूर्य, चंद्र आहेस.
तूच ब्रह्म, भूः, भुवः, स्वः आहेस.
---
७.
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् ।
अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् ।
तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् ॥७॥
अर्थ :
‘ग’ हा अक्षर प्रथम उच्चारून त्यानंतर ‘ण’ उच्चरावे.
अनुस्वार (ं), अर्धचंद्र (◌ं) आणि नाद यांनी युक्त हा तुझा मंत्रस्वरूप ओंकार आहे.
---
८.
गकारः पूर्वरूपम् ।
अकारो मध्यरूपम् ।
णकारः पररूपम् ।
बिन्दुरुत्तररूपम् ।
नादः संधानम् ।
सङ्घीतं संधिः ॥८॥
अर्थ :
‘ग’ हे पूर्वरूप, ‘अ’ हे मध्यरूप, ‘ण’ हे पररूप, बिंदू (ं) हे उत्तररूप,
नाद हा संधान व संधी आहे.
---
९.
सैषा गणेशविद्या ।
गणक ऋषिः ।
निचृद्गायत्री छन्दः ।
गणपतिर्देवता ।
ॐ गं गणपतये नमः ॥९॥
अर्थ :
ही गणेशविद्या आहे.
गणक ऋषी आहेत, निचृत् गायत्री हे छंद आहेत,
गणपति ही देवता आहे.
मंत्र : ॐ गं गणपतये नमः
---
१०.
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥१०॥
अर्थ :
आपण एकदंत गणपतीला जाणतो, वक्रतुण्डाला ध्यान करतो.
तो दंती देव आम्हाला प्रबोधन करो.
---
११.
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् ।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।
रक्तगन्धाऽनुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् ।
भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम् ।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥११॥
अर्थ :
एकदंत, चार हात असलेले, पाश व अंकुश धारण करणारे,
वरद (वर देणारे) हात असलेले, मूषकध्वजधारी,
लालवर्णी, लांब पोटाचे, शूर्पकर्ण असलेले, लाल वस्त्रांनी अलंकृत,
लाल चंदनाने अंगाने सुगंधित, लाल फुलांनी पूजिलेले,
भक्तांवर करुणा करणारे, जगत्कारण असलेले, अच्युत,
सृष्टीच्या आरंभी प्रकृती व पुरुष यांच्यापलीकडे प्रकट झालेले –
जो माणूस अशा स्वरूपात नित्य ध्यान करतो, तो योगीमध्ये श्रेष्ठ होतो.
---
१२.
नमो व्रातपतये । नमो गणपतये ।
नमः प्रमथपतये ।
नमस्तेऽस्तु lambodarāya ।
एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः ॥१२॥
अर्थ :
व्रातपती गणपतीला नमस्कार.
प्रमथपती गणपतीला नमस्कार.
लांबोदर, एकदंत, विघ्ननाशक, शिवसुत, वरद मूर्ती तुला नमस्कार.
---
उपसंहार
अर्थ : या उपनिषदाचा भाव असा आहे की गणपती म्हणजेच परब्रह्म.
तेच सृष्टीचे कारण, पालनकर्ता व संहारकर्ता आहेत.
योगी त्यांचे ध्यान करतात.
या अथर्वशीर्षाचा नित्य जप केल्यास विद्या, बुद्धी, आयुष्य, आरोग्य आणि समृद्धी मिळते असे सांगितले आहे.
गणपतीचे प्रत्येक अंग, प्रत्येक अवयव आणि त्याच्या मूर्तीतील प्रत्येक घटक हा फक्त शिल्पकलेचा भाग नसून त्यामागे खोल अध्यात्मिक, तात्त्विक आणि मानसशास्त्रीय प्रतीकात्मक अर्थ आहे. हिंदू धर्मशास्त्र, उपनिषदे, पुराणे आणि तंत्रशास्त्रानुसार गणपतीचे सहा हात, सोंड, डोळे, मस्तक, पोट, पाय, कान, मद, दात आणि गंडस्थळे ही सर्व काही जीवनातील गहन सत्य, तत्त्वज्ञान आणि आचारधर्माचे प्रतीक आहेत. चला, प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा पाहूया:
---
१. सहा हात (षड्भुजा)
गणपतीचे सहा हात म्हणजे षड्-ऋतू आणि षड्-शड्रिपू (सहा शत्रू) यांवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती दाखवतात.
षड्-ऋतू: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर
→ मनुष्याला प्रत्येक ऋतूतील जीवनशैलीशी जुळवून घेण्याची शिकवण.
षड्-शड्रिपू: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य
→ हे सहा शत्रू जिंकूनच आत्मसाक्षात्कार साध्य होतो.
त्यामुळे गणपतीच्या सहा हातांतून कर्म, ज्ञान, साधना, नियंत्रण आणि संतुलनाचे प्रतीक दिसते.
---
२. सोंड (सूंड)
गणपतीची सोंड ज्ञान, अनुकूलता आणि कार्यकौशल्य यांचे प्रतीक आहे.
हत्तीची सोंड जशी कधी कोमलतेने सुई उचलते तर कधी प्रचंड वृक्ष उखडते, त्याप्रमाणेच जीवनात सूक्ष्म व स्थूल दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.
सोंड म्हणजे विवेकबुद्धी — सत्य आणि असत्य वेगळे करण्याची क्षमता.
---
३. डोळे
गणपतीचे दोन डोळे सत्य व ज्ञानाचे दृष्टीकोन दाखवतात.
दोन डोळे म्हणजे भौतिक जग आणि अध्यात्मिक जग — दोन्ही समजून घेण्याची क्षमता.
काही मूर्तींमध्ये तिसरा डोळाही असतो, तो अंतर्दृष्टी किंवा आत्मज्ञान याचे प्रतीक आहे.
---
४. मस्तक (मोठे डोके)
गणपतीचे विशाल मस्तक मोठा विचार, सखोल चिंतन आणि व्यापक दृष्टिकोन यांचे प्रतीक आहे.
आपले विचार सीमित नसावेत, ते विस्तृत व सार्वत्रिक असावेत, ही शिकवण गणपतीचे मस्तक देते.
---
५. पोट (मोठे पोट)
गणपतीचे मोठे पोट म्हणजे सहनशीलता, स्वीकार आणि समाधान.
जीवनात सुख-दुःख, यश-अपयश, लाभ-हानी सर्वकाही पचवण्याची कला गणपती शिकवतात.
तसंच, हे विश्वाचे प्रतीक आहे — सर्व जगत, पाप-पुण्य, ब्रह्मांड एकत्र धारण करणारे.
---
६. पाय
गणपतीचे पाय दोन तत्त्वांचे प्रतीक आहेत:
एक पाय जमिनीवर → भौतिक जगाशी जोडलेले राहणे
दुसरा पाय वर → आध्यात्मिक उन्नतीकडे झेप घेणे
ही समतोल साधण्याची शिकवण आहे.
---
७. कान (मोठे कान)
गणपतीचे मोठे कान म्हणजे जास्त ऐका, कमी बोला ही तत्त्वज्ञानाची शिकवण.
शहाणपण फक्त बोलण्यात नाही, तर समजून घेण्यात आणि ऐकण्यात आहे.
कान ज्ञानसंकलन आणि विवेकशक्तीचे प्रतीक आहेत.
---
८. मस्तकावरील मद (गजमद)
हत्ती रुतूमध्ये येतो तेव्हा त्याच्या मस्तकावरून गंधयुक्त द्रव (मद) वाहतो.
हा मद प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि सर्जनशीलता यांचे प्रतीक आहे.
पण हा अहंकार नाही, तर अंतर्गत शक्तीचे नियंत्रित प्रकटीकरण आहे.
---
९. दात (मोठा आणि तुटलेला दात)
गणपतीचा एक दात पूर्ण आणि दुसरा तुटलेला असतो.
पूर्ण दात: आनंद, श्रद्धा, जीवनातील स्थैर्य
तुटलेला दात: त्याग, दुःख, जीवनातील बदलाची स्वीकृती
महाभारतातील परंपरेनुसार, गणपतींनी महाभारत लिहिताना आपला दात तोडून लेखणी म्हणून वापरला — यावरून ज्ञानासाठी त्याग हेही शिकवण मिळते.
---
१०. गंडस्थळे (मस्तकाच्या बाजूचे फुगलेले भाग)
गणपतीच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंची गंडस्थळे म्हणजे प्रसन्नता, सौंदर्य आणि आत्मविश्वास.
हत्ती रागावल्यावर गंडस्थळांमधून द्रव वाहतो, म्हणून हे प्रचंड सामर्थ्य आणि अंतर्गत ऊर्जा यांचेही प्रतीक आहे.
आध्यात्मिक दृष्टीने हे ओज, तेज आणि प्राणशक्ती दर्शवतात.
---
सारांश
गणपतीच्या मूर्तीतील प्रत्येक भाग म्हणजे जीवन, ज्ञान, नियंत्रण, समतोल आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे.
सहा हात → शड्रिपूंवर विजय
सोंड → विवेकबुद्धी
डोळे → अंतर्दृष्टी
मस्तक → मोठा विचार
पोट → सहनशीलता
पाय → भौतिक आणि अध्यात्मिक संतुलन
कान → जास्त ऐकणे
मद → नियंत्रित ऊर्जा
दात → त्याग आणि स्थैर्य
गंडस्थळे → प्रसन्नता आणि सामर्थ्य.
गणपतीचे प्रत्येक अंग, प्रत्येक अवयव आणि त्याच्या मूर्तीतील प्रत्येक घटक हा फक्त शिल्पकलेचा भाग नसून त्यामागे खोल अध्यात्मिक, तात्त्विक आणि मानसशास्त्रीय प्रतीकात्मक अर्थ आहे. हिंदू धर्मशास्त्र, उपनिषदे, पुराणे आणि तंत्रशास्त्रानुसार गणपतीचे सहा हात, सोंड, डोळे, मस्तक, पोट, पाय, कान, मद, दात आणि गंडस्थळे ही सर्व काही जीवनातील गहन सत्य, तत्त्वज्ञान आणि आचारधर्माचे प्रतीक आहेत. चला, प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा पाहूया:
---
१. सहा हात (षड्भुजा)
गणपतीचे सहा हात म्हणजे षड्-ऋतू आणि षड्-शड्रिपू (सहा शत्रू) यांवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती दाखवतात.
षड्-ऋतू: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर
→ मनुष्याला प्रत्येक ऋतूतील जीवनशैलीशी जुळवून घेण्याची शिकवण.
षड्-शड्रिपू: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य
→ हे सहा शत्रू जिंकूनच आत्मसाक्षात्कार साध्य होतो.
त्यामुळे गणपतीच्या सहा हातांतून कर्म, ज्ञान, साधना, नियंत्रण आणि संतुलनाचे प्रतीक दिसते.
---
२. सोंड (सूंड)
गणपतीची सोंड ज्ञान, अनुकूलता आणि कार्यकौशल्य यांचे प्रतीक आहे.
हत्तीची सोंड जशी कधी कोमलतेने सुई उचलते तर कधी प्रचंड वृक्ष उखडते, त्याप्रमाणेच जीवनात सूक्ष्म व स्थूल दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.
सोंड म्हणजे विवेकबुद्धी — सत्य आणि असत्य वेगळे करण्याची क्षमता.
---
३. डोळे
गणपतीचे दोन डोळे सत्य व ज्ञानाचे दृष्टीकोन दाखवतात.
दोन डोळे म्हणजे भौतिक जग आणि अध्यात्मिक जग — दोन्ही समजून घेण्याची क्षमता.
काही मूर्तींमध्ये तिसरा डोळाही असतो, तो अंतर्दृष्टी किंवा आत्मज्ञान याचे प्रतीक आहे.
---
४. मस्तक (मोठे डोके)
गणपतीचे विशाल मस्तक मोठा विचार, सखोल चिंतन आणि व्यापक दृष्टिकोन यांचे प्रतीक आहे.
आपले विचार सीमित नसावेत, ते विस्तृत व सार्वत्रिक असावेत, ही शिकवण गणपतीचे मस्तक देते.
---
५. पोट (मोठे पोट)
गणपतीचे मोठे पोट म्हणजे सहनशीलता, स्वीकार आणि समाधान.
जीवनात सुख-दुःख, यश-अपयश, लाभ-हानी सर्वकाही पचवण्याची कला गणपती शिकवतात.
तसंच, हे विश्वाचे प्रतीक आहे — सर्व जगत, पाप-पुण्य, ब्रह्मांड एकत्र धारण करणारे.
---
६. पाय
गणपतीचे पाय दोन तत्त्वांचे प्रतीक आहेत:
एक पाय जमिनीवर → भौतिक जगाशी जोडलेले राहणे
दुसरा पाय वर → आध्यात्मिक उन्नतीकडे झेप घेणे
ही समतोल साधण्याची शिकवण आहे.
---
७. कान (मोठे कान)
गणपतीचे मोठे कान म्हणजे जास्त ऐका, कमी बोला ही तत्त्वज्ञानाची शिकवण.
शहाणपण फक्त बोलण्यात नाही, तर समजून घेण्यात आणि ऐकण्यात आहे.
कान ज्ञानसंकलन आणि विवेकशक्तीचे प्रतीक आहेत.
---
८. मस्तकावरील मद (गजमद)
हत्ती रुतूमध्ये येतो तेव्हा त्याच्या मस्तकावरून गंधयुक्त द्रव (मद) वाहतो.
हा मद प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि सर्जनशीलता यांचे प्रतीक आहे.
पण हा अहंकार नाही, तर अंतर्गत शक्तीचे नियंत्रित प्रकटीकरण आहे.
---
९. दात (मोठा आणि तुटलेला दात)
गणपतीचा एक दात पूर्ण आणि दुसरा तुटलेला असतो.
पूर्ण दात: आनंद, श्रद्धा, जीवनातील स्थैर्य
तुटलेला दात: त्याग, दुःख, जीवनातील बदलाची स्वीकृती
महाभारतातील परंपरेनुसार, गणपतींनी महाभारत लिहिताना आपला दात तोडून लेखणी म्हणून वापरला — यावरून ज्ञानासाठी त्याग हेही शिकवण मिळते.
---
१०. गंडस्थळे (मस्तकाच्या बाजूचे फुगलेले भाग)
गणपतीच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंची गंडस्थळे म्हणजे प्रसन्नता, सौंदर्य आणि आत्मविश्वास.
हत्ती रागावल्यावर गंडस्थळांमधून द्रव वाहतो, म्हणून हे प्रचंड सामर्थ्य आणि अंतर्गत ऊर्जा यांचेही प्रतीक आहे.
आध्यात्मिक दृष्टीने हे ओज, तेज आणि प्राणशक्ती दर्शवतात.
---
सारांश
गणपतीच्या मूर्तीतील प्रत्येक भाग म्हणजे जीवन, ज्ञान, नियंत्रण, समतोल आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे.
सहा हात → शड्रिपूंवर विजय
सोंड → विवेकबुद्धी
डोळे → अंतर्दृष्टी
मस्तक → मोठा विचार
पोट → सहनशीलता
पाय → भौतिक आणि अध्यात्मिक संतुलन
कान → जास्त ऐकणे
मद → नियंत्रित ऊर्जा
दात → त्याग आणि स्थैर्य
गंडस्थळे → प्रसन्नता आणि सामर्थ्य.
ऋषिपंचमी
भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमी. आज आपल्या वेदकालीन पूर्वजांचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस.
नमोस्तु ऋषिवृंदेभ्यो देवर्षिभ्यो नमो नमः।
सर्वपापहरेभ्यो हि वेदविद्भ्यो नमो नमः॥
ऋषी समुदायातील जे देवर्षी आहेत, सर्व पापांचे हरण करणारे आहेत आणि वेद जाणणारे आहेत त्यांना माझा वारंवार नमस्कार असो.
ज्यांनी वेदांचे प्रकटीकरण केले. त्यांचा अर्थ सर्वसामान्य पुढील पिढ्यांना समजेल असा सुलभ करून सांगितला. शास्त्रार्थ समजावला. अलौकिक धर्मग्रंथांचे ज्ञान भंडार खुले केले. संस्कृती, संस्कार, परंपरा यांचा दिव्य वारसा आपल्याला अनंतकाळ टिकेल असा देणाऱ्या असंख्य ऋषींचा आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सप्तऋषींना वंदन करण्याचा आजचा दिवस.
अनेक सुधारणावादी लोकांना वाटते की, ऋषी म्हणजे केवळ हिमालयात जाऊन तपस्या करणारे किंवा विश्वामित्रांसारखे तेजोभंग पावणारे.. तसा आधुनिक काळात ऋषींना कुचेष्टेचा विषय केला आहे. परंतु त्यांच्या तप:साधने सोबत त्यांचे शाश्वत असलेले अक्षर साहित्य मात्र कोठेही चर्चेत येत नाही.
ऋषींनी लिहिलेल्या ग्रंथांवर आज मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे .आपण मात्र त्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्यांचे साहित्य काय होते ? हे अत्यंत थोडक्यात आज जाणून घेऊया.
१) वशिष्ठ ऋषी
वशिष्ठ ऋषींनी नऊ ग्रंथ लिहिले आहेत. वशिष्ठ संहिता, वशिष्ठ कल्प, वशिष्ठ पुराण, वशिष्ठ लिंग पुराण, वशिष्ठ शिक्षा, वशिष्ठ श्राद्धकल्प,वशिष्ठ होम प्रकार, वशिष्ठ तंत्र स्थापत्यशास्त्र इ.
२) अगस्ती ऋषी
अगस्ती ऋषींनी लिहिलेल्या
ग्रंथापैकी केवळ चार ग्रंथ उपलब्ध आहेत. अगस्त गीता, अगस्त संहिता, शिवसंहिता, द्वैध निर्णय तंत्र इत्यादी.
३) कपिल ऋषी
कपिल ऋषींनी असंख्य ग्रंथांची रचना केली पण, त्यापैकी केवळ आठ ग्रंथ उपलब्ध आहेत. सांख्यसूत्र, तत्वसमास, व्यास प्रभाकर,कपिल गीता, कपिल तंत्रज्ञान, कपिल संहिता, कपिल स्तोत्र, कपिल स्मृती इत्यादी.
४) अत्रि ऋषी
अत्रि ऋषींच्याही असंख्य ग्रंथांपैकी चार ग्रंथ सध्या उपलब्ध आहेत. अत्रि संहिता, अत्रि स्मृती, लघुअत्री स्मृती, बृहद्दत्तात्रेय स्मृती इत्यादी.
५) पराशर कृषी
पराशर ऋषींचे आठ ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यापैकी बृहत पराशर होरा शास्त्र, लघुपराशरी बृहत पराशरीयसंहिता, पराशर पुराण, पराशरोदित नीतीशास्त्रम्, पराशरोधित केवल सारम् इत्यादी
६) व्यास ऋषी
व्यासांची वाड्मयसंपदा विशालकाय आहे. त्यांचे अठरा पुराणे उपलब्ध आहेत. लिंगपुराण, स्कंदपुराण, विष्णुपुराण, गरुड पुराण, पद्मपुराण, भविष्यपुराण, वायुपुराण, नारदपुराण, ब्रम्हांडपुराण, मत्स्यपुराण, ब्रह्मपुराण, ब्रम्हवैवर्त पुराण ,भागवत पुराण, कुर्मपुराण, वामनपुराण, वराहपुराण, मार्कंडेयपुराण, अग्निपुराण इत्यादी
७) याज्ञवलक्य ऋषी
यांचे नऊ ग्रंथ उपलब्ध आहेत. शुक्ल यजुर्वेद, शतपत ब्राह्मण, योगसूत्रे, बृहद्दारन्यकोपनिषद, याज्ञवलक्य शिक्षा,
याज्ञवलक्य गीता,बृहद् याज्ञवलक्य, याज्ञवलक्य स्मृती, बृहद् योगी याज्ञवलक्य इत्यादी.
८) दुर्वास ऋषी
दुर्वास ऋषींनी चार ग्रंथांचे लेखन केलं आहे. आर्य द्विशक्ती, दैवी महिमा स्तोत्र, पाराशिव महिमा स्तोत्र, ललिता स्तवरला इत्यादी.
८) शौनक ऋषी
शौनक ऋषींचे १० ग्रंथ उपलब्ध आहेत. ऋक- प्रातीशास्त्र, छान्दानुक्रमणी, ऋष्यानुक्रमणी, अनुवाकानुक्रमणी, कनानुनुक्रमणी, बृहद देवता, ऋग्विविधान, सुक्तानुक्रमणि, पद्मविधान, चरणव्यूह इ.
९) ऋष्यशृंग
यांनी दोन ग्रंथांचे लेखन केले
ऋष्यशृंगसंहिता, ऋष्यशृंगस्मृती.
१०) मांडव्य ऋषी
मांडवी ऋषींनी एकच ग्रंथ लिहिला. तो म्हणजे मांडव्य संहिता होय.
११) भृगू ऋषी
भृगू ऋषी यांनी एकूण सहा ग्रंथ लिहिले. भृगू स्मृति , भृगूगीता भृगुसंहिता, भृगु सिद्धांत, भृगूसूत्र, स्थापत्यशास्त्र इत्यादी.
१२) गार्ग्य ऋषी
ज्योतिगार्ग्य, बृहद् गार्ग्य हे दोन ग्रंथ लिहिले.
१३) कण्व ऋषी
कण्व ऋषींनी कण्वनिती, कण्व संहिता, कान्वोपनिषद, कण्व स्मृति इत्यादी ग्रंथांचे लेखन केले.
१४) अष्टावक्र ऋषी
अष्टावक्र गीता, अष्टावक्र संहिता या दोन ग्रंथांचे त्यांनी लेखन केले.
१५) गौतम ऋषी
गौतम ऋषींचे चार ग्रंथ प्रसिद्ध आहेत. गौतम धर्मशास्त्र, गौतमस्मृती,
वृद्धगौतम, बृहदगौतम इत्यादी.
ब्रम्हर्षी, राजर्षी, देवऋषी ही महापदे ही कोणत्याही विद्यापीठाची पदवी नाही की, ती कोणापुढे लावायला. चिंतनशीलतेतून विशुद्ध विचार प्रकट होतात. चिंतनशीलतेतूनच
ब्रम्हर्षीपण प्रकट होते. आपली संस्कृती टिकवण्यासाठी धर्म टिकवण्यासाठी सत्ता पैसा तपोवनातील गुरु कार्यार्थ दान देतात ते राजर्षी. राजर्षींना देखील ब्रम्हर्षीची प्रेरणा असते. चिंतनशीलतेतून आत्मविकास साधण्यासाठी देव, दानव, मानव सर्वांच्या घरात जाऊन प्रभु प्रतिष्ठा वाढवण्याचे कुशलता साधतो तो देवर्षी.
किती लिहावे,?.. असंख्य ऋषींनी अत्यंत संपन्न, समृद्ध अक्षर ज्ञानाचा वारसा आपल्यासाठी दिला आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव ठेवून विनम्र भावे नतमस्तक.
एते सप्तर्षय: सर्वे भक्त्या संपूजिता मया l
सर्वे पापं व्यापोहंतु ज्ञानतोSज्ञानता कृतम ll
श्री. संतोष भोसेकर.
*मूर्तीमध्ये देवत्व कसे येते..?*
*वास्तविक चराचरात परमेश्वर भरलेला असतो... त्यामुळे मूर्तीमध्येही तो असतोच याविषयी संदेह नाही. पण मानवाच्या उन्नतीसाठी व आध्यात्मिक साधनेसाठी परमेश्वर विषयक ही संकल्पना पुरेशी ठरत नाही. कारण त्याला हवा असतो 'देव' आणि तोही चराचरातील नव्हे, तर समोर ठेवलेल्या मूर्तीमधील. अशा वेळी मनाचे, नेत्रांचे एकाग्र लक्ष होण्यासाठी मूर्ती किंवा फोटोवाचून गत्यंतरच नसते. मूर्तीमुळे त्याची देवविषयक जाण किंवा दखल सतत जागृत राहते. तो आपल्या नेत्रांनी सतत मूर्तीचे अवलोकन करतो, त्या मूर्तीकडे पाहताच त्याला जप करावा वाटतो व मूर्तीच्या सहवासामुळे त्या देवाचे चरित्र मनात सारखे घोळत राहते. अशा वेळी मूर्ती निर्जीव व चेतनाहीन असूनही वरील कार्ये घडतात. तर मग त्या मूर्तीतून कंपने, स्पंदन लहरी बाहेर पडू लागल्या तर केवढा परिणाम होऊ शकेल ? ही कंपने व स्पंदने बाहेर पडण्यासाठी त्या मूर्तीमध्ये काही संस्कार घडावे लागतात.....*
*मनाने त्या मूर्तीच्या सहवासात माणसांचे वास्तव्य घडले की आपोआपच त्या मूर्तीमधील देवत्व जागृत होऊ लागते. शास्त्रामध्ये मूर्तीची अर्चा (प्रतिष्ठा) सांगितलेली आहे. त्यात जलाधिवास, धान्यराशीकरण, प्राणप्रतिष्ठा, होम अशी अनेक अंगे आहेत. ती सर्व प्रातिनिधीक स्वरूपाची आहेत. केवळ नुसती स्थापना केलेली एखादी मूर्तीदेखील काही दिवसांनी दृष्टांत देऊ लागते. ज्यावेळी प्राणप्रतिष्ठेचा शास्त्रोक्त विधी माहीत नसेल, तेव्हा त्या मूर्तीची समंत्रक (किंवा अमंत्रक) षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करून देखील त्या मूर्तीमध्ये देवत्व येते. वरचेवर पंचामृत अभिषेक, उद्वार्जन (लिंबू, भस्म लावून देव स्वच्छ करणे), आरती, नवरात्रविधी इत्यादी सोपस्कारांनी मूर्तीमध्ये देवत्व सिध्द होऊन ती मूर्ती घरातील वातावरण प्रसन्न ठेवू शकते.....*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
*गणेशोत्सव : ५ हजार वर्षांपासून केले जाते पार्थिव गणपती पूजन?*
*श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे... भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता, असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात.....*
*मात्र, घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली, याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो. जाणून घेऊया...*
*चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशीपासून सुरू होते... यानंतर व्रत-वैकल्यांचा राजा मानला गेलेला श्रावण महिना सुरू होतो. श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते.....*
*एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला... महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता. असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. गणेशासंदर्भात अनेक पौराणिक कथा दिसून येतात.....*
*महाभारत लेखक गणपती...*
*महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली, हे आपल्या सर्वांना माहिती आहे... मात्र, महर्षी व्यासांनी महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणपतीकडून लिहून घेतले. घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली, असे सांगितले जाते.....*
*महाभारताची रचना करताना महर्षी व्यास आणि गणपती यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या... गणपतीला आपल्या लेखनाच्या गतीबाबत आत्मविश्वास होता. गणपती महर्षी व्यासांना म्हणाले की, तुम्ही महाभारत कथा हळूहळू सांगणार असाल, तर मला कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी. ही अट आपणास मान्य असेल, तर आणि तरच लेखनाची जबाबदारी मान्य करेन, अशी अट गणपतीने घातली.....*
*महाभारत लेखनाचा श्रीगणेशा...*
*व्यास महर्षी होते... गणपतीच्या अटीवर त्यांनी केवळ स्मित हास्य केले. महर्षी व्यास गणपतीला म्हणाले की, आपली अट मला मान्य आहे. मात्र, मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला, उमगला, तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे. अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे, अशी अट महर्षी व्यासांनी ठेवली. गणपती तयार झाले आणि त्यांनी महाभारत लेखनाचा श्रीगणेशा केला.....*
*महर्षी व्यास नेमके काय सांगताहेत, हे समजून घ्यायला अनेकदा गणपतीला विलंब व्हायला लागला... संपूर्ण महाभारत कथा समजून लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते.....*
*घरोघरी पार्थिव गणपती पूजन.*
*महाभारत कथा पूर्ण होण्यात मोठा कालावधी लोटला... कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. हा लेप लावून लावून जाडसर झाला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून महाभारताचा लेखक म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.....*
*महाभारतकालीन गणपती अवतार...*
*गणेशाने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात अवतार घेतल्याचे सांगितले जाते... गणेशाने सतयुगात कश्यप आणि अदितीकडे महोत्कट विनायकाच्या अवतार धारण केला. या युगात गणपतीने देवतान्तक आणि नरान्तक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केली आणि आपल्या अवतारकार्याची सांगता केली. गणेश त्रेता युगात मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले. तर, द्वापारयुगात गणेश उंदीरावर बसून प्रगट झाले. गणेशाला पौराणिक पत्रकार किंवा लेखक असेही संबोधले जाते. कारण याच युगातील अवतारात त्यांनी महाभारत लिहिले होते, असे सांगितले जाते.....*
*पेशवे आणि घरगुती गणेशोत्सव...*
*सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले... हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला. दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला- पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले.....*
*किर्तनकार, प्रवचनकार ह.भ.प.*
*सौ.सोंनालीताई महाराज मोरे-कापसे*
*मो.7038920920*
*🔸श्रीगणेश सहस्त्र नाम🔸*
*१. ॐ गणेशाय नम: ।*
*२. ॐ गणाध्यक्षाय नम: ।*
*३. ॐ गणाराध्याय नम: ।*
*४. ॐ गणप्रियाय नम: ।*
*५. ॐ गणनाथाय नम: ।*
*६. ॐ गणस्वामिने नम: ।*
*७. ॐ गणेशाय नम: ।*
*८. ॐ गणनायकाय नम: ।*
*९. ॐ गणमूर्तये नम: ।*
*१०. ॐ गणपतये नम: ।*
*११. ॐ गणत्रात्रे नम: ।*
*१२. ॐ गणञ्जयाय नम: ।*
*१३. ॐ गणपाय नम: ।*
*१४. ॐ गणक्रीडाय नम: ।*
*१५. ॐ गणदेवाय नम: ।*
*१६. ॐ गणाधिपाय नम: ।*
*१७. ॐ गणज्येष्ठाय नम: ।*
*१८. ॐ गणश्रेष्ठाय नम: ।*
*१९. ॐ गणप्रेष्ठाय नम: ।*
*२०. ॐ गणाधिराजे नम: ।*
*२१. ॐ गणराजे नम: ।*
*२२. ॐ गणगोप्त्रे नम: ।*
*२३. ॐ गणाङ्गाय नम: ।*
*२४. ॐ गणदैवताय नम: ।*
*२५. ॐ गणबन्धवे नम: ।*
*२६. ॐ गणसुह्रदे नम: ।*
*२७. ॐ गणाधीशाय नम: ।*
*२८. ॐ गणप्रथाय नम: ।*
*२९. ॐ गणप्रियसखाय नम: ।*
*३०. ॐ गणप्रियसुह्रदे नम: ।*
*३१. ॐ गणप्रियरताय नम: ।*
*३२. ॐ गणप्रीतिविवर्धनाय नम:*
*३३. ॐ गणमण्डलमध्यस्थाय नम: ।*
*३४. ॐ गणकेलिपरायणाय नम: ।*
*३५. ॐ गणाग्रण्ये नम: ।*
*३६. ॐ गणेशानाय नम: ।*
*३७. ॐ गणगीताय नम: ।*
*३८. ॐ गणोच्छ्रयाय नम: ।*
*३९. ॐ गण्याय नम: ।*
*४०. ॐ गणहिताय नम: ।*
*४१. ॐ गर्जद्गणसेनाय नम: ।*
*४२. ॐ गणोद्धताय नम: ।*
*४३. ॐ गणभीतिप्रमथनाय नम: ।*
*४४. ॐ गणभीत्यपहारकाय नम: ।*
*४५. ॐ गणनार्हाय नम: ।*
*४६. ॐ गणप्रौढाय नम: ।*
*४७. ॐ गणभर्त्रे नम: ।*
*४८. ॐ गणप्रभवे नम: ।*
*४९. ॐ गणसेनाय नम: ।*
*५०. ॐ गणचराय नम: ।*
*५१. ॐ गणप्राज्ञाय नम: ।*
*५२. ॐ गणैकराजे नम: ।*
*५३. ॐ गणाग्रयाय नम: ।*
*५४. ॐ गणनाम्ने नम: ।*
*५५. ॐ गणपालनतत्परय नम: ।*
*५६. ॐ गणजिते नम: ।*
*५७. ॐ गणगर्भस्थाय नम: ।*
*५८. ॐ गणप्रवणमानसाय नम: ।*
*५९. ॐ गणगर्वपरीहर्त्रे नम: ।*
*६०. ॐ गणाय नम: ।*
*६१. ॐ गणनमस्कृताय नम: ।*
*६२. ॐ गणार्चिताङ्घ्रियुगलाय नम: ।*
६३. ॐ गणरक्षणकृते नम: ।*
*६४. ॐ गणध्याताय नम: ।*
*६५. ॐ गणगुरवे नम: ।*
*६६. ॐ गणप्रणयत्पराय नम: ।*
६७. ॐ गणागणपरित्रात्रे नम: ।*
*६८. ॐ गणाधिहरणोद्धुराय नम: ।*
*६९. ॐ गणसेतवे नम: ।*
*७०. ॐ गणनुताय नम: ।*
*७१. ॐ गणकेतवे नम: ।*
*७२. ॐ गणाग्रगाय नम: ।*
*७३. ॐ गणहेतवे नम: ।*
*७४. ॐ गणग्राहिणे नम: ।*
*७५. ॐ गणानुग्रहकारकाय नम: ।*
*७६. ॐ गणागणानुग्रहभुवे नम: ।*
*७७. ॐ गणागणवरप्रदाय नम: ।*
*७८. ॐ गणस्तुताय नम: ।*
*७९. ॐ गणप्राणाय नम: ।*
*८०. ॐ गणसर्वस्वदायकाय नम: ।*
*८१. ॐ गणवल्लभमूर्तये नम: ।*
*८२. ॐ गणभूतये नम: ।*
*८३. ॐ गणेष्टदाय नम: ।*
*८४. ॐ गणसौख्यप्रदात्रे नम: ।*
*८५. ॐ गणदु:खप्रणाशनाय नम: ।*
*८६. ॐ गणप्रथितनाम्ने नम: ।*
*८७. ॐ गणाभीष्टकराय नम: ।*
*८८. ॐ गणमान्याय नम: ।*
*८९. ॐ गणख्याताय नम: ।*
*९०. ॐ गणवीताय नम: ।*
*९१. ॐ गणोत्कटाय नम: ।*
*९२. ॐ गणपालाय नम: ।*
*९३. ॐ गणवराय नम: ।*
*९४. ॐ गणगौरवदायकाय नम: ।*
*९५. ॐ गणगर्जितसंतुष्टाय नम: ।*
*९६. ॐ गणस्वच्छन्दगाय नम: ।*
*९७. ॐ गणराजाय नम: ।*
*९८. ॐ गणश्रीदाय नम: ।*
*९९. ॐ गणाभयकराय नम: ।*
*१००. ॐ गणमूर्धाभिषिक्ताय नम: ।*
*१०१. ॐ गणसैन्यपुर:सराय नम: ।*
*१०२. ॐ गुणातीताय नम: ।*
*१०३. ॐ गुणमयाय नम: ।*
*१०४. ॐ गुणत्रयविभागकृते नम: ।*
*१०५. ॐ गुणिने नम: ।*
*१०६. ॐ गुणाकृतिधराय नम: ।*
*१०७. ॐ गुणशालिने नम: ।*
*१०८. ॐ गुणप्रियाय नम: ।*
*१०९. ॐ गुणपूर्णाय नम: ।*
*११०. ॐ गुणाम्भोधये नम: ।*
*१११. ॐ गुणभाजे नम: ।*
*११२. ॐ गुणदूरगाय नम: ।*
*११३. ॐ गुणागुणवपुषे नम: ।*
*११४. ॐ गौणशरीराय नम: ।*
*११५. ॐ गुणमण्डिताय नम: ।*
*११६. ॐ गुणस्त्रष्ट्रे नम: ।*
*११७. ॐ गुणेशानाय नम: ।*
*११८. ॐ गुणेशाय नम: ।*
*११९. ॐ गुणेश्वराय नम: ।*
*१२०. ॐ गुणसृष्टजगत्संघाय नम: ।*
*१२१. ॐ गुणसंघाय नम: ।*
*१२२. ॐ गुणैकराजे नम: ।*
*१२३. ॐ गुणप्रवृष्टाय नम: ।*
*१२४. ॐ गुणभुवे नम: ।*
*१२५. ॐ गुणीकृतचराचराय नम: ।*
*१२६. ॐ गुणप्रवणसंतुष्टाय नम: ।*
*१२७. ॐ गुणहीनपराङ्मुखाय नम: ।*
*१२८. ॐ गुणैकभुवे नम: ।*
*१२९. ॐ गुणश्रेष्ठाय नम: ।*
*१३०. ॐ गुणज्येष्ठाय नम: ।*
*१३१. ॐ गुणप्रभवे नम: ।*
*१३२. ॐ गुणज्ञाय नम: ।*
*१३३. ॐ गुणसम्पूज्याय नम: ।*
*१३४. ॐ गुणैकसदनाय नम: ।*
*१३५. ॐ गुणप्रणयवते नम: ।*
*१३६. ॐ गौणप्रकृतये नम: ।*
*१३७. ॐ गुणभाजनाय नम: ।*
*१३८. ॐ गुणिप्रणतपादाब्जाय नम: ।*
*१३९. ॐ गुणिगीताय नम: ।*
*१४०. ॐ गुणोज्ज्वलाय नम: ।*
*१४१. ॐ गुणवते नम: ।*
*१४२. ॐ गुणसम्पन्नाय नम: ।*
*१४३. ॐ गुणानन्दितमानसाय नम: ।*
*१४४. ॐ गुणसंचारचतुराय नम: ।*
*१४५. ॐ गुणसंचयसुन्दराय नम: ।*
*१४६. ॐ गुणगौराय नम: ।*
*१४७. ॐ गुणाधाराय नम: ।*
*१४८. ॐ गुणसंवृतचेतनाय नम: ।*
*१४९. ॐ गुणकृते नम: ।*
*१५०. ॐ गुणभृते नम: ।*
*१५१. ॐ गुणाग्रयाय नम: ।*
*१५२. ॐ गुणपारदृशे नम: ।*
*१५३. ॐ गुणप्रचारिणे नम: ।*
*१५४. ॐ गुणयुजे नम: ।*
*१५५. ॐ गुणागुणविवेककृते नम: ।*
*१५६. ॐ गुणाकराय नम: ।*
*१५७. ॐ गुणकराय नम: ।*
*१५८. ॐ गुणप्रवणवर्धनाय नम: ।*
*१५९. ॐ गुणगूढचराय नम: ।*
*१६०. ॐ गौणसर्वसंसारचेष्टिताय नम: ।*
*१६१. ॐ गुणदक्षिणसौहार्दाय नम: ।*
*१६२. ॐ गुणलक्षणतत्त्वविदे नम: ।*
*१६३. ॐ गुणहारिणे नम: ।*
*१६४. ॐ गुणकलाय नम: ।*
*१६५. ॐ गुणसंघसखाय नम: ।*
*१६६. ॐ गुणसंस्कृतसंसाराय नम: ।*
*१६७. ॐ गुणतत्त्वविवेचकाय नम: ।*
*१६८. ॐ गुणगर्वधराय नम: ।*
*१६९. ॐ गौणसुखदु:खोदयाय नम: ।*
*१७०. ॐ गुणाय नम: ।*
*१७१. ॐ गुणाधीशाय नम: ।*
*१७२. ॐ गुणलयाय नम: ।*
*१७३. ॐ गुणवीक्षणलालसाय नम: ।*
*१७४. ॐ गुणगौरवदात्रे नम: ।*
*१७५. ॐ गुणदात्रे नम: ।*
*१७६. ॐ गुणप्रदाय नम: ।*
*१७७. ॐ गुणकृते नम: ।*
*१७८. ॐ गुणसम्बन्धाय नम: ।*
*१७९. ॐ गुणभृते नम: ।*
*१८०. ॐ गुणबन्धनाय नम: ।*
*१८१. ॐ गुणह्रद्याय नम: ।*
*१८२. ॐ गुणस्थायिने नम: ।*
*१८३. ॐ गुणदायिने नम: ।*
*१८४. ॐ गुणोत्कटाय नम: ।*
*१८५. ॐ गुणचक्रधराय नम: ।*
*१८६. ॐ गौणावताराय नम: ।*
*१८७. ॐ गुणबान्धवाय नम: ।*
*१८८. ॐ गुणबन्धवे नम: ।*
*१८९. ॐ गुणप्रज्ञाय नम: ।*
*१९०. ॐ गुणप्राज्ञाय नम: ।*
*१९१. ॐ गुणालयाय नम: ।*
*१९२. ॐ गुणधात्रे नम: ।*
*१९३. ॐ गुणप्राणाय नम: ।*
*१९४. ॐ गुणगोपाय नम: ।*
*१९५. ॐ गुणाश्रयाय नम: ।*
*१९६. ॐ गुणयायिने नम: ।*
*१९७. ॐ गुणाधायिने नम: ।*
*१९८. ॐ गुणपाय नम: ।*
*१९९. ॐ गुणपालकाय नम: ।*
*२००. ॐ गुणाह्रततनवे नम: ।*
*२०१. ॐ गौणाय नम: ।*
*२०२. ॐ गीर्वाणाय नम: ।*
*२०३. ॐ गुणगौरवाय नम: ।*
*२०४. ॐ गुणवत्पूजितपदाय नम: ।*
*२०५. ॐ गुणवत्प्रीतिदायकाय नम: ।*
*२०६. ॐ गुणवत्गीतकीर्तये नम: ।*
*२०७. ॐ गुणवद्बद्धसौह्रदाय नम: ।*
*२०८. ॐ गुणवद्वरदाय नम: ।*
*२०९. ॐ गुणवत्प्रतिपालकाय नम: ।*
*२१०. ॐ गुणवद्गुणसंतुष्टाय नम: ।*
*२११. ॐ गुणवद्रचितस्तवाय नम: ।*
*२१२. ॐ गुणव्रदक्षणपराय नम: ।*
*२१३. ॐ गुणवत्प्रणयप्रियाय नम: ।*
*२१४. ॐ गुणवच्चक्रसंचाराय नम: ।*
*२१५. ॐ गुणवत्कीर्तिवर्धनाय नम: ।*
*२१६. ॐ गुणवद्गुणचित्तस्थाय नम: ।*
*२१७. ॐ गुणवद्गुणरक्षकाय नम: ।*
*२१८. ॐ गुणवत्पोषणकराय नम: ।*
*२१९. ॐ गुणवच्छत्रुसूदनाय नम: ।*
*२२०. ॐ गुणवत्सिद्धिदात्रे नम: ।*
*२२१. ॐ गुणवद्गौरवप्रदाय नम: ।*
*२२२. ॐ गुणवत्प्रवणस्वान्ताय नम: ।*
*२२३. ॐ गुणवद्गुणभूषणाय नम: ।*
*२२४. ॐ गुणवत्कुलविद्वेषिविनाशकरणक्षमाय नम: ।*
*२२५. ॐ गुणिस्तुतगुणाय नम: ।*
*२२६. ॐ गर्जत्प्रलयाम्बुदनि:स्वनाय नम: ।*
*२२७. ॐ गजाय नम: ।*
*२२८. ॐ गजपतये नम: ।*
*२२९. ॐ गर्जद्गजयुद्धविशारदाय नम: ।*
*२३०. ॐ गजास्याय नम: ।*
*२३१. ॐ गजकर्णाय नम: ।*
*२३२. ॐ गजराजाय नम: ।*
*२३३. ॐ गजाननाय नम: ।*
*२३४. ॐ गजरूपधराय नम: ।*
*२३५. ॐ गर्जद्गजयूथोद्धुरध्वनये नम: ।*
*२३६. ॐ गजाधीशाय नम: ।*
*२३७. ॐ गजाधाराय नम: ।*
*२३८. ॐ गजासुरजयोद्धुराय नम: ।*
*२३९. ॐ गजदन्ताय नम: ।*
*२४०. ॐ गजवराय नम: ।*
*२४१. ॐ गजकुम्भाय नम: ।*
*२४२. ॐ गजध्वनये नम: ।*
*२४३. गजमायाय नम: ।*
*२४४. ॐ गजमयाय नम: ।*
*२४५. ॐ गजाश्रिये नम: ।*
*२४६. ॐ गजगर्जिताय नम: ।*
*२४७. ॐ गजामयहराय नम: ।*
*२४८. ॐ गजपुष्टिप्रदायकाय नम: ।*
*२४९. ॐ गजोत्पत्तये नम: ।*
*२५०. ॐ गजत्रात्रे नम: ।*
*२५१. ॐ गजहेतवे नम: ।*
*२५२. ॐ गजाधिपाय नम: ।*
*२५३. ॐ गजमुख्याय नम: ।*
*२५४. ॐ गजकुलप्रवराय नम: ।*
*२५५. ॐ गजदैत्यघ्ने नम: ।*
*२५६. ॐ गजकेतवे नम: ।*
*२५७. ॐ गजाध्यक्षाय नम: ।*
*२५८. ॐ गजसेतवे नम: ।*
*२५९. ॐ गजाकृतये नम: ।*
*२६०. ॐ गजवन्द्याय नम: ।*
*२६१. ॐ गजप्राणाय नम: ।*
*२६२. ॐ गजसेव्याय नम: ।*
*२६३. ॐ गजप्रभवे नम: ।*
*२६४. ॐ गजमत्ताय नम: ।*
*२६५. ॐ गजेशानाय नम: ।*
*२६६. ॐ गजेशाय नम: ।*
*२६७. ॐ गजपुङ्गवाय नम: ।*
*२६८. ॐ गजदन्तधराय नम: ।*
*२६९. ॐ गञ्जन्मधुपाय नम: ।*
*२७०. ॐ गजवेषभृते नम: ।*
*२७१. ॐ गजच्छन्नय नम: ।*
*२७२. ॐ गजाग्रस्थाय नम: ।*
*२७३. ॐ गजयायिने नम: ।*
*२७४. ॐ गजाजयाय नम: ।*
*२७५. ॐ गजराजे नम: ।*
*२७६. ॐ गजयूथस्थाय नम: ।*
*२७७. ॐ गजगञ्जकभञ्जकाय नम: ।*
*२७८. ॐ गर्जितोज्झितदैत्यासवे नम: ।*
*२७९. ॐ गर्जितत्रातविष्टपाय नम: ।*
*२८०. ॐ गानज्ञाय नम: ।*
*२८१. ॐ गानकुशलाय नम: ।*
*२८२. ॐ गानतत्त्वविवेचकाय नम: ।*
*२८३. ॐ गानश्लाघिने नम: ।*
*२८४. ॐ गानरसाय नम: ।*
*२८५. ॐ गानज्ञानपरायणाय नम: ।*
*२८६. ॐ गानगमज्ञाय नम: ।*
*२८७. ॐ गानाङ्गाय नम: ।*
*२८८. ॐ गनप्रवणचेतनाय नम: ।*
*२८९. ॐ गानकृते नम: ।*
*२९०. ॐ गानचतुराय नम: ।*
*२९१. ॐ गानविद्याविशारदाय नम: ।*
*२९२. ॐ गानध्येयाय नम: ।*
*२९३ ॐ गानगम्याय नम: ।*
*२९४. ॐ गानध्यानपरायणाय नम: ।*
*२९५. ॐ गानभुवे नम: ।*
*२९६. ॐ गानशीलाय नम: ।*
*२९७. ॐ गानशालिने नम: ।*
*२९८. ॐ गतश्रमाय नम: ।*
*२९९. ॐ गानविज्ञानसम्पन्नाय नम: ।*
*३००. ॐ गानश्रवणलालसाय नम: ।*
*३०१. ॐ गानयत्ताय नम: ।*
*३०२. ॐ गानमयाय नम: ।*
*३०३. ॐ गानप्रणयवते नम: ।*
*३०४. ॐ गानध्यात्रे नम: ।*
*३०५. ॐ गानबुद्धये नम: ।*
*३०६. ॐ गानोत्सुकमनसे नम: ।*
*३०७. ॐ गानोत्सुकाय नम: ।*
*३०८. ॐ गानभूमये नम: ।*
*३०९. ॐ गानसीम्ने नम: ।*
*३१०. ॐ गुणोज्ज्वलाय नम: ।*
*३११. ॐ गानाङ्गज्ञानवते नम: ।*
*३१२. ॐ गानमानवते नम: ।*
*३१३. ॐ गानपेशलाय नम: ।*
*३१४. ॐ गानवत्प्रणयाय नम: ।*
*३१५. ॐ गानसमुद्राय नम: ।*
*३१६. ॐ गानभूषणाय नम: ।*
*३१७. ॐ गानसिन्धवे नम: ।*
*३१८. ॐ गानपराय नम: ।*
*३१९. ॐ गानप्राणाय नम: ।*
*३२०. ॐ गणाश्रयाय नम: ।*
*३२१. ॐ गानैकभुवे नम: ।*
*३२२. ॐ गानह्रष्टाय नम: ।*
*३२३. ॐ गानचक्षुषे नम: ।*
*३२४. ॐ गणैकदृशे नम: ।*
*३२५. ॐ गानमत्ताय नम: ।*
*३२६. ॐ गानरुचये नम: ।*
*३२७. ॐ गानविदे नम: ।*
*३२८. ॐ गानवित्प्रियाय नम: ।*
*३२९. ॐ गानान्तरात्मने नम: ।*
*३३०. ॐ गानाढ्याय नम: ।*
*३३१. ॐ गानभ्राजत्सभाय नम: ।*
*३३२. ॐ गानमायाय नम: ।*
*३३३. ॐ गानधराय नम: ।*
*३३४. ॐ गानविद्याविशोधकाय नम: ।*
*३३५. ॐ गानाहितघ्नाय नम: ।*
*३३६. ॐ गानेन्द्राय नम: ।*
*३३७. ॐ गानलीनाय नम: ।*
*३३८. ॐ गतिप्रियाय नम: ।*
*३३९. ॐ गानाधीशाय नम: ।*
*३४०. ॐ गानलयाय नम: ।*
*३४१. ॐ गानाधाराय नम: ।*
*३४२. ॐ गतीश्वराय नम: ।*
*३४३. ॐ गानवन्मानदाय नम: ।*
*३४४. ॐ गानभूतये नम: ।*
*३४५. ॐ गानैकभुतिमते नम: ।*
*३४६. ॐ गानतानतताय नम: ।*
*३४७. ॐ गानतानदानविमोहिताय नम: ।*
*३४८. ॐ गुरवे नम: ।*
*३४९. ॐ गुरूदरश्रोणये नम: ।*
*३५०. ॐ गुरुतत्त्वार्थदर्शनाय नम: ।*
*३५१. ॐ गुरुस्तुताय नम: ।*
*३५२. ॐ गुरुगुणाय नम: ।*
*३५३. ॐ गुरुमायाय नम: ।*
*३५४. ॐ गुरुप्रियाय नम: ।*
*३५५. ॐ गुरुकीर्तये नम: ।*
*३५६. ॐ गुरुभुजाय नम: ।*
*३५७. ॐ गुरुवक्षसे नम: ।*
*३५८. ॐ गुरुप्रभाय नम: ।*
*३५९. ॐ गुरुलक्षणसम्पन्नाय नम: ।*
*३६०. ॐ गुरुद्रोहपराङमुखाय नम: ।*
*३६१. ॐ गुरुविद्याय नम: ।*
*३६२. ॐ गुरुप्राणाय नम: ।*
*३६३. ॐ गुरुबाहुबलोच्छ्रयाय नम: ।*
*३६४. ॐ गुरुदैत्यप्राणहराय नम: ।*
*३६५. ॐ गुरुदैत्यापहारकाय नम: ।*
*३६६. ॐ गुरुगर्वहराय नम: ।*
*३६७. ॐ गुह्यप्रवराय नम: ।*
*३६८. ॐ गुरुदर्पघ्ने नम: ।*
*३६९. ॐ गुरुगौरवदायिने नम: ।*
*३७०. ॐ गुरुभीत्यपहारकाय नम: ।*
*३७१. ॐ गुरुशुण्डाय नम: ।*
*३७२. ॐ गुरुस्कन्धाय नम: ।*
*३७३. ॐ गुरुजङ्घाय नम: ।*
*३७४. ॐ गुरुप्रथाय नम: ।*
*३७५. ॐ गुरुभालाय नम: ।*
*३७६. ॐ गुरुगलाय नम: ।*
*३७७. ॐ गुरुश्रिये नम: ।*
*३७८. ॐ गुरुगर्वनुदे नम: ।*
*३७९. ॐ गुरूरवे नम: ।*
*३८०. ॐ गुरुपीनांसाय नम: ।*
*३८१. ॐ गुरुप्रणयलालसाय नम: ।*
*३८२. ॐ गुरुमुख्याय नम: ।*
*३८३. ॐ गुरुकुलस्थायिने नम: ।*
*३८४. ॐ गुरुगुणाय नम: ।*
*३८५. ॐ गुरुसंशयभेत्त्रे नम: ।*
*३८६. ॐ गुरुमानप्रदायकाय नम: ।*
*३८७. ॐ गुरुधर्मसदाराध्याय नम: ।*
*३८८. ॐ गुरुधर्मनिकेतनाय नम: ।*
*३८९. ॐ गुरुदैत्यकुलच्छेत्त्रे नम: ।*
*३९०. ॐ गुरुसैन्याय नम: ।*
*३९१. ॐ गुरुद्युतये नम: ।*
*३९२. ॐ गुरुधर्माग्रगण्याय नम: ।*
*३९३. ॐ गुरुधर्मधुरन्धराय नम: ।*
*३९४. ॐ गरिष्ठाय नम: ।*
*३९५. ॐ गुरुसंतापशमनाय नम: ।*
*३९६. ॐ गुरुपूजिताय नम: ।*
*३९७. ॐ गुरुधर्मधराय नम: ।*
*३९८. ॐ गौरधर्माधाराय नम: ।*
*३९९. ॐ गदापहाय नम: ।*
*४००. ॐ गुरुशास्त्रविचारज्ञाय नम: ।*
*४०१. ॐ गुरुशास्त्रक्रुतोद्यमाय नम: ।*
*४०२. ॐ गुरुशास्त्रार्थनिलयाय नम: ।*
*४०३. ॐ गुरुशास्त्रालयाय नम: ।*
*४०४. ॐ गुरुमन्त्राय नम: ।*
*४०५. ॐ गुरुश्रेष्ठाय नम: ।*
*४०६. ॐ गुरुमन्त्रफलप्रदाय नम: ।*
*४०७. ॐ गुरुस्त्रीगमनोद्दामप्रायश्चित्तनिवारकाय नम: ।*
*४०८. ॐ गुरुसंसारसुखदाय नम: ।*
*४०९. ॐ गुरुसंसारदु:खभिदे नम: ।*
*४१०. ॐ गुरुश्लाघापराय नम: ।*
*४११. ॐ गौरभानुखण्डावतंसभृते नम: ।*
*४१२. ॐ गुरुप्रसन्नमूर्तये नम: ।*
*४१३. ॐ गुरुशापविमोचकाय नम: ।*
*४१४. ॐ गुरुकान्तये नम: ।*
*४१५. ॐ गुरुमयाय नम: ।*
*४१६. ॐ गुरुशासनपालकाय नम: ।*
*४१७. ॐ गुरुतन्त्राय नम: ।*
*४१८. ॐ गुरुप्रज्ञाय नम: ।*
*४१९. ॐ गुरुभाय नम: ।*
*४२०. ॐ गुरुदैवताय नम: ।*
*४२१. ॐ गुरुविक्रमसंचाराय नम: ।*
*४२२. ॐ गुरुदृशे नम: ।*
*४२३. ॐ गुरुविक्रमाय नम: ।*
*४२४. ॐ गुरुक्रमाय नम: ।*
*४२५. ॐ गुरुप्रेष्ठाय नम: ।*
*४२६. ॐ गुरुपाखण्डखण्डकाय नम: ।*
*४२७. ॐ गुरुगर्जितसम्पूर्णब्रह्माण्डाय नम: ।*
*४२८. ॐ गुरुगर्जिताय नम: ।*
*४२९. ॐ गुरुपुत्रप्रियसखाय नम: ।*
*४३०. ॐ गुरुपुत्रभयापहाय नम: ।*
*४३१. ॐ गुरुपुत्रपरित्रात्रे नम: ।*
*४३२. ॐ गुरुपुत्रवरप्रदाय नम: ।*
*४३३. ॐ गुरुपुत्रार्तिशमनाय नम: ।*
*४३४. ॐ गुरुपुत्राधिनाशनाय नम: ।*
*४३५. ॐ गुरुपुत्रप्राणदात्रे नम: ।*
*४३६. ॐ गुरुभक्तिपरायणाय नम: ।*
*४३७. ॐ गुरुविज्ञानविभवाय नम: ।*
*४३८. ॐ गौरभानुवरप्रदाय नम: ।*
*४३९. ॐ गौरभानुस्तुताय नम: ।*
*४४०. ॐ गौरभानुत्रासापहारकाय नम: ।*
*४४१. ॐ गौरभानुप्रियाय नम: ।*
*४४२. ॐ गौरभानवे नम: ।*
*४४३. ॐ गौरववर्धनाय नम: ।*
*४४४. ॐ गौरभानुपरित्रात्रे नम: ।*
*४४५. ॐ गौरभानुसखाय नम: ।*
*४४६. ॐ गौरभानुप्रभवे नम: ।*
*४४७. ॐ गौरभानुभीतिप्रणाशनाय नम: ।*
*४४८. ॐ गौरीतेज:समुत्पन्नाय नम: ।*
*४४९. ॐ गौरीह्रदयनन्दनाय नम: ।*
*४५०. ॐ गौरीस्तनन्धयाय नम: ।*
*४५१. ॐ गौरीमनोवाञ्छित्तसिद्धिकृते नम: ।*
*४५२. ॐ गौराय नम: ।*
*४५३. ॐ गौरगुणाय नम: ।*
*४५४. ॐ गौरप्रकाशाय नम: ।*
*४५५. ॐ गौरभैरवाय नम: ।*
*४५६. ॐ गौरीशनन्दनाय नम: ।*
*४५७. ॐ गौरीप्रियपुत्राय नम: ।*
*४५८. ॐ गदाधराय नम: ।*
*४५९. ॐ गौरीवरप्रदाय नम: ।*
*४६०. ॐ गौरीप्रणयाय नम: ।*
*४६१. ॐ गौरसच्छवये नम: ।*
*४६२. ॐ गौरीगणेश्वराय नम: ।*
*४६३. ॐ गौरीप्रवणाय नम: ।*
*४६४. ॐ गौरभावनाय नम: ।*
*४६५. ॐ गौरात्मने नम: ।*
*४६६. ॐ गौरकीर्तये नम: ।*
*४६७. ॐ गौरभावाय नम: ।*
*४६८. ॐ गरिष्ठदृशे नम: ।*
*४६९. ॐ गौतमाय नम: ।*
*४७०. ॐ गौतमीनाथाय नम: ।*
*४७१. ॐ गौतमीप्राणवल्लभाय नम: ।*
*४७२. ॐ गौतमाभीष्टवरदाय नम: ।*
*४७३. ॐ गौतमाभयदायकाय नम: ।*
*४७४. ॐ गौतमप्रणयप्रह्वाय नम: ।*
*४७५. ॐ गौतमाश्रमदु:खघ्ने नम: ।*
*४७६. ॐ गौतमीतीरसंचारिणे नम: ।*
*४७७. ॐ गौतमीतीर्थनायकाय नम: ।*
*४७८. ॐ गौतमापत्परिहराय नम: ।*
*४७९. ॐ गौतमाधिविनाशनाय नम: ।*
*४८०. ॐ गोपतये नम: ।*
*४८१. ॐ गोधनाय नम: ।*
*४८२. ॐ गोपाय नम: ।*
*४८३. ॐ गोपालप्रियदर्शनाय नम: ।*
*४८४. ॐ गोपालाय नम: ।*
*४८५. ॐ गोगणाधीशाय नम: ।*
*४८६. ॐ गोकश्मलनिवर्तकाय नम: ।*
*४८७. ॐ गोसहस्राय नम: ।*
*४८८. ॐ गोपवराय नम: ।*
*४८९. ॐ गोपगोपीसुखावहाय नम: ।*
*४९०. ॐ गोवर्धनाय नम: ।*
*४९१. ॐ गोपगोपाय नम: ।*
*४९२. ॐ गोपाय नम: ।*
*४९३. ॐ गोकुलवर्धनाय नम: ।*
*४९४. ॐ गोचराय नम: ।*
*४९५. ॐ गोचराध्यक्षाय नम: ।*
*४९६. ॐ गोचरप्रीतिवृद्धिकृते नम: ।*
*४९७. ॐ गोमिने नम: ।*
*४९८. ॐ गोकष्टसंत्रात्रे नम: ।*
*४९९. ॐ गोसंतापनिवर्तकाय नम: ।*
*५००. ॐ गोष्ठाय नम: ।*
*५०१. ॐ गोष्ठाश्रयाय नम: ।*
*५०२. ॐ गोष्ठपतये नम: ।*
*५०३. ॐ गोधनवर्धनाय नम: ।*
*५०४. ॐ गोष्ठप्रियाय नम: ।*
*५०५. ॐ गोष्ठमयाय नम: ।*
*५०६. ॐ गोष्ठामयनिवर्तकाय नम: ।*
*५०७. ॐ गोलोकाय नम: ।*
*५०८. ॐ गोलकाय नम: ।*
*५०९. ॐ गोभृते नम: ।*
*५१०. ॐ गोभर्त्रे नम: ।*
*५११. ॐ गोसुखावहाय नम: ।*
*५१२. ॐ गुदुहे नम: ।*
*५१३. ॐ गोधुग्गणप्रेष्ठाय नम: ।*
*५१४. ॐ गोदोग्धे नम: ।*
*५१५. ॐ गोमयप्रियाय नम: ।*
*५१६. ॐ गोत्राय नम: ।*
*५१७. ॐ गोत्रपतये नम: ।*
*५१८. ॐ गोत्रप्रभवे नम: ।*
*५१९. ॐ गोत्रभयापहाय नम: ।*
*५२०. ॐ गोत्रवृद्धिकराय नम: ।*
*५२१. ॐ गोत्रप्रियाय नम: ।*
*५२२. ॐ गोत्रार्तिनाशनाय नम: ।*
*५२३. ॐ गोत्रोद्धारपराय नम: ।*
*५२४. ॐ गोत्रप्रवराय नम: ।*
*५२५. ॐ गोत्रदैवताय नम: ।*
*५२६. ॐ गोत्रविख्यातनाम्ने नम: ।*
*५२७. ॐ गोत्रिणे नम: ।*
*५२८. ॐ गोत्रप्रपालकाय नम: ।*
*५२९. ॐ गोत्रसेतवे नम: ।*
*५३०. ॐ गोत्रकेतवे नम: ।*
*५३१. ॐ गोत्रहेतवे नम: ।*
*५३२. ॐ गतक्लमाय नम: ।*
*५३३. ॐ गोत्रत्राणकराय नम: ।*
*५३४. ॐ गोत्रपतये नम: ।*
*५३५. ॐ गोत्रेशपूजिताय नम: ।*
*५३६. ॐ गोत्रभिदे नम: ।*
*५३७. ॐ गोत्रभीत्त्रात्रे नम: ।*
*५३८. ॐ गोत्रभिद्वरदायकाय नम: ।*
*५३९. ॐ गोत्रभित्पूजितपदाय नम: ।*
*५४०. ॐ गोत्रभिच्छत्रुसूदनाय नम: ।*
*५४१. ॐ गोत्रभित्प्रीतिदाय नम: ।*
*५४२. ॐ गोत्रभिदे नम: ।*
*५४३. ॐ गोत्रपालकाय नम: ।*
*५४४. ॐ गोत्रभिद्गीतचरिताय नम: ।*
*५४५. ॐ गोत्रभिद्राज्यरक्षकाय नम: ।*
*५४६. ॐ गोत्रभिज्जयदायिने नम: ।*
*५४७. ॐ गोत्रभित्प्रणयाय नम: ।*
*५४८. ॐ गोत्रभिद्भयसम्भेत्त्रे नम: ।*
*५४९. ॐ गोत्रभिन्मानदायकाय नम: ।*
*५५०. ॐ गोत्रभिद्गोपनपराय नम: ।*
*५५१. ॐ गोत्रभित्सैन्यनायकाय नम: ।*
*५५२. ॐ गोत्राधिपप्रियाय नम: ।*
*५५३. ॐ गोत्रपुत्रीपुत्राय नम: ।*
*५५४. ॐ गिरिप्रियाय नम: ।*
*५५५. ॐ ग्रन्थज्ञाय नम: ।*
*५५६. ॐ ग्रन्थकृते नम: ।*
*५५७. ॐ ग्रन्थग्रन्थिभिदे नम: ।*
*५५८. ॐ ग्रन्थविघ्नघ्ने नम: ।*
*५५९. ॐ ग्रन्थादये नम: ।*
*५६०. ॐ ग्रन्थसंचाराय नम: ।*
*५६१. ॐ ग्रन्थश्रवणलोलुपाय नम: ।*
*५६२. ॐ ग्रन्थाधीनक्रियाय नम: ।*
*५६३. ॐ ग्रन्थप्रियाय नम: ।*
*५६४. ॐ ग्रन्थार्थतत्त्वविदे नम: ।*
*५६५. ॐ ग्रन्थसंशयसंछेदिने नम: ।*
*५६६. ॐ ग्रन्थवक्त्रे नम: ।*
*५६७. ॐ ग्रहाग्रण्ये नम: ।*
*५६८. ॐ ग्रन्थगीतगुणाय नम: ।*
*५६९. ॐ ग्रन्थगीताय नम: ।*
*५७०. ॐ ग्रन्थादिपूजिताय नम: ।*
*५७१. ॐ ग्रन्थारम्भस्तुताय नम: ।*
*५७२. ॐ ग्रन्थग्राहिणे नम: ।*
*५७३. ॐ ग्रन्थार्थपारदृशे नम: ।*
*५७४. ॐ ग्रन्थदृशे नम: ।*
*५७५. ॐ ग्रन्थविज्ञानाय नम: ।*
*५७६. ॐ ग्रन्थसंदर्भशोधकाय नम: ।*
*५७७. ॐ ग्रन्थकृत्पूजिताय नम: ।*
*५७८. ॐ ग्रन्थकराय नम: ॥*
*🔸गणेश मंत्रांचे महत्त्व.🔸*
*साधनामंत्र...*
*अ. `श्री गणेशाय नम: ।' यातील श्री हा श्रीं आहे व तो बीजमंत्र आहे... गणेशाय ही मूळ बीजाची संकल्पना आहे, तर नम: हे पल्लव आहे.....*
*आ. `ॐ गँ गणपतये नम: ।'*
*अर्थ : ॐ म्हणजे प्रणव, गँ म्हणजे मूळ बीजमंत्र, गणपतये म्हणजे आकृतिबंधाला व नम: म्हणजे नमस्कार करतो.....*
*बीजमंत्र...*
*`गँ' हा गणपतीचा मूळ बीजमंत्र आहे... गणपतीची, म्हणजे पंचमहाभूतांतील तेजप्रवाहांची, उत्पत्ति ज्या तेजसमूहापासून झाली, तो तेजसमूह `गँ' या बीजमंत्रात अंतर्भूत आहे. `गँ'चा उच्चार , ञ, ण, न, म, या पाच अनुनासिकांना एकत्र करून जो उच्चार होईल, त्याप्रमाणे असतो.....*
*मंदाराच्या, म्हणजे पांढर्या रुईच्या झाडापुढे `गँ' ची आवर्तने केल्यास त्या झाडाची एक मुळी वर येते... तिला गणेशाचा आकार असतो. त्याचे कारण याप्रमाणे आहे - `गँ' च्या उच्चाराने त्याची स्पंदने (शक्ति) वातावरणात निर्माण होतात. त्यांचा झाडाच्या मुळावर परिणाम होतो आणि `शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व त्यांच्याशी संबंधित शक्ति एकत्र असतात', या नियमानुसार शक्तीबरोबर गणेशाच्या रूपाची मुळी वर येते. सात-आठ वर्षांहून जास्त वयाच्या पांढर्या रुईच्या वृक्षाला जमिनीतून मुळासकट बाहेर काढले असता त्याच्या मुळाचा आकार गणपतीप्रमाणे दिसतो.....*
*अंगारकयोग (मंगळवारी संकष्टी चतुर्थी) किंवा रविवारी पुष्य नक्षत्र असेल तेव्हा मंदार च्या सात-आठ वर्षांहून जास्त वयाच्या वृक्षाची षोडशोपचारे पूजा करून अथर्वशीर्षाचा पाठ करावा... साधारणत: चतुर्थीपासून सुरू करून दुसर्या चतुर्थीपर्यंत एक हजार पाठ करावे. नंतर हवन करून प्रत्येकी शंभर मोदक, लाह्या व दूर्वाकुरांची आहुति द्यावी. शेवटी कुणाशी न बोलता व कुणालाही स्पर्श न करता ते झाड मुळापासून उपटून काढावे. त्याचा आकार गणपतीसारखाच असतो. ही संस्कारित मूर्ति घरी स्थापन करावी. ह्या मूर्तीच्या पूजनाने अनेक प्रकारच्या सिद्धी तसेच ऐश्वर्य प्राप्त होते. मूर्तीची दररोज धूप, दीप व नैवेद्य यांसह पूजा करून अथर्वशीर्षाचा पाठ म्हणावा. शक्ति संक्रमित होऊन नाहीशी होऊ नये म्हणून बहुधा अशी मूर्ति झाकून ठेवतात.....*
*खार्या पाण्यातील गारगोटीवर `गँ' मंत्राचा कमीतकमी वर्षभर उच्चार केल्यास गारगोटीचा आकार गणपतीसारखा होतो.....*
*स्त्रोत: आंतरजाल...*
*🔸बलराम.🔸*
*🟣२९/०८/२५- बलराम जयंती...🙏*
*बलराम हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता, सुभद्रा त्याची सख्खी बहीण... बलरामाला बलभद्र, हलधर, हलायुध, इत्यादी अनेक नावे आहेत संकर्षण आदी नावे असून, अनंतशेषाचा अवतार आहे पांचरात्र शास्त्रानुसार बलराम (बलभद्र) वासुदेवाचे स्वरूप आहे; ‘नारायणीयोपाख्यात’ मध्ये वर्णन केलेल्या तत्वज्ञानानुसार विष्णूचे चार रूपांतील 'चतुर्व्यूह' दुसरे रूप म्हणजे ‘संकर्षण.' उत्तरभारत हिंदी भाषेत 'बलदाऊ' म्हणतात. नांगर हे बलरामाचे हत्यार असून ते खांद्यावर घेऊन तो हिंडत असतो.....*
*बलरामाची पत्नी रेवती आहे... घटनाक्रम सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंतचा आहे. ज्यामध्ये काळचक्र भेद सांगितला आहे. सतयुगात महाराजा रैवतक हे पृथ्वीचा सम्राट होते, ज्याच्या मुलीचे नाव राजकन्या रेवती होते. महाराजा रैवतकने आपल्या मुलीला सर्व प्रकारचे शिक्षण दिले. जेव्हा रेवतीची तारुण्यता झाली, तेव्हा तिचे वडील रैवतक यांनी लग्नासाठी पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट वराचा शोध सुरू केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेवतीसाठी संपूर्ण पृथ्वीवर कोणालाही वर सापडला नाही, ज्यामुळे महाराजा रैवतक निराश झाला.....*
*नंतर महाराज रैवतकने आपली कन्या रेवतीसाठी वराच्या शोधात ब्रह्मलोकात जाण्याचे ठरवले... महाराज रैवतक आपली मुलगी रेवतीसमवेत ब्रह्मलोकास गेले. ब्रह्मदेवाने सांगितल्या प्रमाणे, त्यानंतर बरेच युग निघून गेले. यावेळी द्वापरयुग पृथ्वीवर आहे, आणि भगवान विष्णू स्वतः कृष्ण म्हणून अवतरले आहेत. आणि त्याचा भाऊ बलराम जो शेषनागचा अवतार आहे.....*
*रेवती २१ फूट उंच होती आणि बलरामाने तिला नांगराच्या टोकाने दाबून, रेवतीला लहान केले, असे पाहून महाराज रैवतकला आश्चर्य वाटले... महाराज रैवतक खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी रेवती आणि बलराम यांच्या लग्नास मान्यता दिली.असे सांगितले जाते.....*
*बलरामचा जन्म...*
*श्रीविष्णु यांनी योगमायापासून देवकीच्या सातव्या गर्भातुन रोहिणीच्या गर्भाशयात ठेवले... क्रूर कंसाने वासुदेव-देवकीला तुरूंगात बंद केले तेव्हा रोहिणी अस्वस्थ झाली; पण पती-सेवेसाठी रोहिणी तुरूंगात जाण्याची परवानगी मिळाली. ती तिथे जायची. यामुळे वासुदेवाचे दुःख बरेच कमी झाले. त्याच वेळी देवकीमध्ये जेव्हा सातवा गर्भ उघडकीस आला, तेव्हा त्याचवेळी गर्भाची लक्षणे एकाच वेळी दिसू लागली. वासुदेवला काळजी होती की, ज्याप्रमाणे कंसाने देवकीच्या ६ मुलांना ठार मारले गेलं त्याचप्रमाणे रोहिणीच्या मुलालाही संशयास्पदरीतीने ठार मारले जाऊ नये. या भीतीने त्याने रोहिणीला आपला भाऊ ब्रजराज नंदगोप यांच्याकडे गुप्तपणे पाठवले आणि रोहिणीला यशोदा नंदाने रोहिणीला आपला गृहात राहायला दिले.....*
*मग तिला तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणा झाली... ब्रजपुर येथे येऊन चार महिने योगमायाने आधीच गर्भाशयात गर्भ धारण केले होते आणि तेथून देवकीचा सातवा गर्भ, रोहिणीमध्ये गर्भाशयात ठेवले. अशा प्रकारे रोहिणीला बलारामाची आई होण्याचे अंतिम भाग्य प्राप्त झाले. योगमाया नंतर, गर्भधारणेच्या सात महिन्यांनंतर - गर्भधारणेच्या चौदा महिन्यांनंतर, रोहिणीने श्रीकृष्णाच्या जन्माच्या आठ दिवस आधी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी, अनन्तरूप बलराम रोहिणीच्या गर्भाशयातून उत्पन्न झाले.....*
*बलराम लहानपणापासूनच अत्यंत गंभीर आणि शांत होता... तो उत्तम कुस्तीपटू तर होताच शिवाय मुष्टियुद्धात तरबेज होता. कंसाच्या तालमीमध्ये कृष्णाने चाणूराला मारले, तर बलरामाने मुष्टिकाला ठोसे मारून ठार केले. महाभारत युद्धप्रसंगी बलराम तटस्थ होता. युद्ध सुरू होण्यापूर्वीच तो तीर्थयात्रेला गेला.....*
*आपआपसातील यादवीमुळे यदुवंशाचा नाश झाल्यानंतर बलराम समुद्रकिनारी आसन लावून बसला आणि त्याने आपला अवतार संपवला.....*
*बलरामाला सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी व्हावे असे वाटत होते, पण श्रीकृष्णाने बलरामाला चकवून, सुभद्रेला (चित्रा) लग्नमंडपातून पळवून आणण्यास अर्जुनाला मदत केली, आणि त्या दोघांचे लग्न लावून दिले.....*
*आंतरजाल...*
*🔸 श्री गणेश महिमा.🔸*
*गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे... एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात.....*
*गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे... एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते.....*
*हिंदूंमध्ये जे अनेक उपासना पंथ निर्माण झाले त्यामध्ये ' गाणपत्य ' हा एक पंथ आहे... गाणपत्याचे दैवत आहे गणपती. पार्वतीच्या अंगाच्या मळापासून गणपती निर्माण झाला अशी एक दंतकथा आहे. त्याप्रमाणे व्यासांनी सांगितलेलं महाभारत गणपतीने लिहिलं अशी समजूत आहे. अंगाने स्थूल , किंचित पिवळट वर्णाचा , मोठ्या पोटाचा , चार हात असलेला व एकदंत , हत्तीचं डोकंअसलेला , असं गणपतीचं रूप पुराणात वर्णिले आहे. त्याने आपल्या चारही हातात शंख , चक्र , गदा व पद्म ही आयुधं धारण केली आहेत.....*
*कधीकधी उंदराला आपलं वाहन करून त्यावर बसून चालला आहे , असंही गणपतीचं वर्णन आढळतं... गणपतीला हत्तीचं मस्तक का लागलं याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत.....*
*शनीच्या कटाक्षापासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून पार्वतीने एकदा शनीला गणपतीकडे बघण्यास सांगितलं... कारण तिला आपल्या पुत्राचा फार अभिमान होता. शनीने गणपतीकडे दृष्टी फिरवताच गणपतींचं मस्तक जळून खाक झालं तेव्हा पार्वतीला अतिशय दु:ख होऊन तिने ब्रह्मादेवास ही हकीकत कथन केली. ब्रह्मादेवाने तिला सांगितलं की तुला पहिल्या प्रथम ज्या प्राण्याचं मस्तक मिळेल ते मस्तक धडाला लाव म्हणजे गणपती पूर्ववत होईल. ब्रह्मादेवाच्या सांगण्याप्रमाणे ती मस्तकाच्या शोधात निघते. प्रथम तिला हत्तीचं मस्तक मिळतं. याप्रमाणे गणपती ' गजवदन ' झाल्याची एक दंतकथा आहे.....*
*दुसरी एक दंतकथा अशी आहे की पार्वती स्नानास बसली असता तिने गणपतीला दरवाजावर राखण करण्याची आज्ञा देते... त्याप्रमाणे गणपती दरवाजाजवळ बसून राहतो. तेवढ्यात शंकर तिथे येतात. परंतु त्यांना आत जाण्यास गणपतीने प्रतिबंध केल्यामुळे ते गणपतीचं शिर उडवतात. त्यामुळे पार्वतीला फार दु:ख होतं. तिचं सांत्वन करण्यासाठी शंकर त्याच्या धडावर हस्तीचं मस्तक बसवून गणपतीला सजीव करतात.....*
*एकदा परशुराम शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात... त्यावेळी शंकर निदिस्त असतात. तेव्हा परशुरामाला अंतर्गृहात येण्यास गणपती मज्जाव करतो. त्या दोघांमध्ये बाचाबाची होऊन युद्ध जुंपतं. गणपती परशुरामाला आपल्या सोंडेत धरून गरगर फिरवताच त्याला मूर्च्छा येते. सावध झाल्यानंतर परशुराम आपला परशू गणपतीवर फेकतात. (शंकरानेच तो परशू परशुरामाला दिलेला असतो. त्यामुळे गणपतीने आदराने तो आपल्या एका दातावर धारण करतो. पण त्यामुळे त्याला तो दात गमावावा लागतो. म्हणूनच गणपतीला ' एकदंत ' किंवा ' एकदंष्ट ' असं म्हणतात.....*
*इतर देवतांप्रमाणे गणपतींची उपासना करणारा एक संप्रादाय भारतात आहे... या संप्रदायाला ' गाणपत्य ' असं म्हणतात. हाच परमात्मा असून त्यानेच सर्व ब्रह्मांड निर्माण केलं असं या पंथाचे अनुयायी मानतात. या पंथाच्या आचार्यांनी निरनिराळे ग्रंथ लिहिले. हे सर्व ग्रंथ त्या पंथाच्या अनुयायांनी प्रमाण मानले आहेत. या संपादायाचे प्रमुख ग्रंथ वस्दतापलीय अगर गणपति तापनीय उपनिषद , गणेश पुराण , मुगदल पुराण व ब्रह्मावैवर्त पुराणाचा गणेश खंड असे आहेत. ' गणेश संहिते ' त अगर ' गणपत्यनिषदा ' त गणपती व ग्रहण हे एक असून गणपती हा जगताचा आदीकारण होय असं सांगितलं आहे. गणेश खंडामध्येदेखील अशाच कथा आहेत.....*
*ब्रह्मावैवर्त पुराणामध्ये एका अध्यायात राधा गणेशाची पूजा करत असे, असं सांगितलं आहे... हे ध्यानात ठेवण्यासारखं आहे. गणेश खंडामध्येदेखील अशाच कथा आहेत. गणेश खंडात शिवाने गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी दहा वर्षं घोर तपश्चर्या केली व त्यापासून त्रिपुरासुराचा वधाचा वर प्राप्त करून घेतला असं वर्णन आलेलं आहे.....*
*गणेश गीता नावाचाही एक ग्रंथ आहे. पण तो जवळजवळ भगवद्गीतेसारखाच आहे... फक्त ' कृष्णाऐवजी गणेश ' नाव घालण्यात आलं आहे याखेरीज ' गणपती कवच ', ' गणपती पंचरत्न ', ' गणपति पंचांग ', ' गणपति पंचावरण स्तोत्र ' ( शंकराचार्यकृत) , ' गणपतीपुराश्चरणाविधी ', ' गणपति पूजा ', ' गणपती पंत्र विधान ', ' गणपति मानसपूजा ', ' गणपति रत्नप्रदीप ', ' गणपति रहस्य ', ' गणपति सूक्त ', ' गणपति स्तवराज ', ' गणेश महात्म ' इत्यादी अनेक गणेश पूजनाचे ग्रंथ आहेत.....*
*आनंदतीर्थांनी लिहिलेल्या ' शंकर दिग्विजया ' मध्ये भया गणपत्यासंबंधीचा व त्यांच्या तत्त्वांचा उल्लेख आला आहे... हा ग्रंथ दहाव्या शतकांमध्ये लिहिला गेला असावा. या ग्रंथामध्ये गाणपत्यांचे सहा पोटभेद होते. हे पोटभेद म्हणजे ' महागणपति पंथ ', ' हरिदागणपति पंथ ', ' उच्छिद गणपति पंथ ', ' नवनीत गणपति पंथ ', ' स्वर्गगणपति पंथ ' व ' सनातन गणपति पंथ ' हे आहेत.....*
*या पंथांपैकी ' उच्छिष्टा गणपति पंथ ' थोडासा चमत्कारिक आहे... या पंथाचे अनुयायी गणपतीची डाव्या हाताने पूजा करतात. हे लोक गणपतीला ' ऐरंब ' हे नाव देतात. या पंथात जातीभेद पाळण्यात येत नाही. सर्व विवाहविषयक निबंधिंना या पंथात थारा नाही. चंदकृति तांबडे गंध लावणे ही गाणपत्यांची मुख्य खूण होय.....*
*भादपद शुद्ध चतुर्थीस (गणेश जन्मदिवसापासून) या सणाला आरंभ होतो... गणेशदेवता व शेतीचा हंगाम यांचा अन्योन्य संबंध असावा. कारण पावसाला उशीर झाल्यामुळे आगामी पीकपाण्याबद्दल अनिश्चितता वाटू लागल्यावर ' विघ्नहर्ता ' गणेशाचं पूजन करणं हे प्रसंगोचित व जरूरी आहे.....*
*' व्रतराज ' ग्रंथात या व्रताचा उल्लेख येते. भादपद शुद्ध चतुथीर्स गणेशाची सुवर्णाची मूर्तीकरून तिची प्राणप्रतिष्ठेपासून पूजा करून हवनादि विधी करावे व नंतर ती मूर्ती ब्राह्माणास दान करावी इत्यादी विधी सांगितला आहे.....*
*विनायकी व संकष्टी चतुर्थी या व्रतांचा संबंध चंदाकडे नसून, गणेशाकडेच आहे... परंतु गणेश व चंद यांचाही अन्योन्य संबंध आहे, ही गोष्ट गणेशचतुर्थीस दिसून येते. कारण त्या दिवशी चंद पाहणं अशुभ मानतात. कोणी चुकून चंद पाहिलाच तर त्याला शेजारच्या घरावर दगड फेकून व चार शिव्या खाऊन ते अशुभ टाळता येतं. चतुर्थीचा चंद पाहणं व विपद्ग्रस्त होणं या गोष्टी मराठीत समानार्थी मानल्या जातात.....*
*पेशव्यांच्या राजवाड्यात प्रतिवर्षी भादपद शुद्ध चतुर्थी ते दशमीपर्यंत गणेशोत्सव होत असे... त्याप्रसंगी गणपती रंग महालात मोठी आरास केली जाई. सर्व कार्यक्रम तिथेच होत. स्वच्छ हंडे, झुंबरे, मोठाले आरसे व विविध चित्रं यामुळे त्या महालाचं सौंदर्य द्विगुणित होत असे. मध्यावर सोन्याच्या भरजरीचं काम जिच्यावर केलं आहे अशी पेशव्यांची ' मनसद ' उर्फ गादी मांडलेली असे. दोन्ही बाजूला मुख्य मराठे सरदार, शिलेदार व दरबारी हे भरजरी पोशाख घालून आपापल्या दर्जाप्रमाणे रांगेने बसलेले असत. भालदार, चोपदार यांच्या ललकारीत स्वारी दरबारात प्रवेश करून मोठ्या ऐटीने सिंहासनारूढ होत असे. गणपती रंग महालात त्यावेळी गाणं, नाच, कथा-कीर्तनं वगैरे कार्यक्रम होत.....*
*या उत्सवात सर्व नोकर- चाकर मोठ्या हौसेने मिसळत... त्यांना पेशव्यांकडून मिठाई वाटण्यात येई. ब्राह्माणभोजनं बरीच होत. विसर्जनाच्या दिवशी पुष्पांनी शृंगारलेल्या पालखीतून थाटाची मिरवणूक काढून गणपती विसर्जन होई. त्यावेळी पेशवे जातीने हजर असत.....*
*गणपती उपासनेचं महात्म्य महाराष्ट्रात व दक्षिण भारतात आढळून येते... दविड लोकांचा हा मूळचा देव असावा. या देवाचं वाहन उंदीर आहे. दविड लोकांची ' औरौन ' म्हणून जी एक जात आहे त्या जातीचे उंदीर हे प्रमुख दैवत आहे. श्रावणकोरमध्ये ' होमपुरे ' उर्फ गणपतीची देवळं पुष्कळ ठिकाणी असून त्या ठिकाणी दररोज होम केला जातो. काही ठिकाणी क्वचित प्रसंगी ' महागणपति होम ' नावाचा खर्चिक होमही करण्यात येतो.....*
*पुण्याजवळ चिंचवडला गणपतीची स्वयंभू मूर्ती असून त्या ठिकाणी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मोठा उत्सव करण्यात येतो... इथल्या मोरया गोसावी नावाच्या साधूने गणपतीला प्रसन्न करून घेतले. ' मी तुझ्या शरीरात व तुझ्यामागून होणाऱ्या सहा पुरुषांत अंश रूपाने वास करेन ,' असा गणपतीने त्याला वर दिला. त्याप्रमाणे मोरया व त्याचे सहा वंशज यांच्यामध्ये गणपती वास करतो , अशी समजूत असून या सात जणांच्या समाधीची गणपती या नात्याने दररोज पूजा करण्यात येते. या गणपती संस्थानला अनेक भाविकांनी देणग्या दिल्या असून , खुद्द औरंगजेब बादशहानेदेखील त्या संस्थानला आठ खेडी इनाम दिल्याचा उल्लेख आढळतो.....*
*स्रोत: आंतरजाल, डॉ. वसंत ज. डोळस, महाराष्ट्र टाईम्स...*
*🔸श्रीगणेश स्तुति.🔸*
*ॐ श्री गणेशाय नम: |*
*ॐ नमो जी श्रीगणेशा । आद्य वन्द्य तु सुरवरेश्वरा । ॐकार_शुण्डा, शूर्प_कर्णा । ब्रह्माण्ड_उदरा, लम्बोदरा... (१)*
*उत्पत्ति, स्थिति, लय कधी ? कसा ?। का ? कुणाचा ? या गणितांच्या । 'समीकरण'रूपी तव 'पाशा'। हस्ती धरुनी क्रीडसी मोदे... (२)*
*तव सु'स्वरूप', लीलादिका । वर्णावे ऐशी मम इच्छा । पूर्ण करावी हीच प्रार्थना । तव चरणी मी करीतसे ...(३)*
*तव लीला_'अवतार' कथा । व्रते, पूजा विधि विधाना । गणेश, मुद्गल पुराणी वर्णिल्या । व्यासावतारी नारायणाने... (४)*
*त्यातील काही वेचक माहिती । 'मराठी' भाषेत करण्यास 'उक्ति' । द्यावी मजला बौद्धिक शक्ति । ऐशी विनवणी तव चरणी ...(५)*
*'कृत'युगी अदिति-कश्यप पुत्र । अवतरलास तु 'महोत्कट' । मारावयास नरांतक देवांतक । लीला विनोदे मांडिली... (६)*
*'त्रेता' युगी तु गिरिजात्मज । नामे 'गुणेश', 'मयूरेश्वर' । मारिलास 'सिंधु' दैत्येश्वर । भक्त संरक्षणाप्रीत्यर्थ ... (७)*
*'द्वापर' युगी ब्रह्मदेवे । देता जांभई 'सिन्दूर' उद्भवे । वरेण्य पुत्र 'गजानन' रूपे । चिरडून 'सिन्दूर'_वर्ण तव झाला ...(८)*
*'कलि' युगी तु युगांत समयी । 'धर्म' पुन: प्रस्थापण्यासी। 'धुम्रकेतु' नामावतारी। प्रगट होशील भविष्यात ...(९)*
*अवस्थेतली चतुर्थावस्था । जिला नाम 'तुरीया' वा 'तुर्या' । तीच स्वानंदे 'सहज' साध्य होता । तव सालोक्य मुक्तिचा लाभ... (१०)*
*चारही पुरुषार्थाञ्चा दाता । चारही सं_कष्टांचा हर्ता । विघ्न कर्ता धर्ता हर्ता । अनाकलनीय या तुझ्या लीला ...(११)*
*तुझे चतुर्थी तिथी_व्रत । शुक्ल, कृष्ण दोनही पक्षांत । 'विनायकी', 'संकष्टी' नामे प्रसिद्ध । प्रिय सर्व गाणेश भक्तासी... (१२)*
*शुक्ल पक्षात चंद्रोदय । दिवसा सूर्योदयानंतर । मेळविण्यास चारही पुरुषार्थ । ज्ञान_सूर्य उजेडात मानसीच्या ...(१३)*
*कृष्ण पक्षात चंद्रोदय । रात्री सूर्यास्ता नंतर । रात्री अंधार अज्ञान तिमिर । त्यावरी सं_कष्टांचा मारा ...(१४)*
*जेथे मानवी शक्ती, युक्ती । अपुरी पडे ऐशिया समयी । गणेशा तुझी कृपा दैवी । मागावया संकष्टी व्रताचरण... (१५)*
*गणेशा तुझी आद्य वंदना । मान्य सर्व वैदिक जना । शैव, शाक्त, सौर, वैष्णवा । 'गाणेश' तर तुझेच अनुयायी... (१६)*
*अवैदिक बौद्ध, जैन, शीख । वीरशैवादिक पंथ अनंत । तेही तुला मानिती अत्यंत । सर्वमान्य तु जगद्वंद्या... (१७)*
*वार_व्रत तव मंगळवारी । भौम, भूमिपुत्र ग्रहाचे वारी । येता 'चतुर्थी' त्याच वारी । 'अंगारकी' योग तव वरदाने... (१८)*
*ऐशी 'अंगारकी' विनायकी । तैशीच 'अंगारकी' "संकष्ट_चतुर्थी" । जे जे भक्तीने आचरिती । 'पुण्यार्जन' त्यांस अधिक होई ...(१८)*
*व्रताचरणार्थ 'उपवास'। पूजा, अर्चना करुनी 'विशेष' । गाती जे तुझी स्तोत्रे सतत । त्यांवरी 'प्रसन्न' होसी तु... (१९)*
*अदिती, पार्वती, लक्ष्मी देवीन्नी । ऐसेच तुजसी सुप्रसन्न करुनी । 'वरदानार्थ' तव मातृत्व मागुनी । अवतार तुजसी घडविले... (२०)*
*अदितीपुत्र 'महोत्कट'। पार्वतीपुत्र 'गिरिजात्मज' । लक्ष्मीपुत्र 'ढुंढिराज'। अवतार तुझे ऐसे नाना ...(२१)*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸गणपती का बसवतात?🔸*
*🔸एक मतप्रवाह.🔸*
*आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते, म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिन्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल आणि त्या मुळे गणपतीला थकवा येईल, आणि पाणिही वर्ज्य होते, अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणपतीची यथा सांग पूजा केली.*
*माती चे लेपन केले, म्हणून गणपती अकडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकड़े पाहिले असता, त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे, आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात बसवले. या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. या काळात गणपतीला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवताे.*
*श्रीगणराया मुर्ती कशी असावी?*
*गणेशमूर्ती शाडू माती असावी. तसेच ती ९ ते ११ इंचच उंचीची असावी. त्याचप्रमाणे ही गणेशमूर्ती निवडतानासुद्धा अथर्वशीर्षांत वर्णिलेल्या गणेशासारखीच असावी.*
*एकदन्तं चतुर्हस्तम् पाशमं कुशधारिणम् ॥*
*रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् । रक्तम् लम्बोदरं शूर्पकर्णकं।।*
*म्हणजेच- एकदन्तम्- एक दात असलेला, चतुर्हस्तम्- चार हात असलेला, पाशमंकुश धारिणम्- पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातांत धारण केलेला, व उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हाताने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा, मोठे सुपासारखे कान, लंबोदर, मूषकासहित अथवा मूषकावर स्वार असणारा, अशी गणेशमूर्ती असावी.*
*गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी?*
*पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.*
*घरच्या प्रमुख व्यक्तीने (शक्यतो बिना चप्पल घालत) गणेशमूर्ती आणावी. त्याकरिता घरातून निघतानांच एक तबक, गुलाल व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे. त्यानंतर वरती वर्णिल्याप्रमाणे गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व ‘मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करीत, आणलेल्या तबकात मूर्ती घ्यावी व त्यावर रुमाल झाकावा व मुलाबाळांसहित अत्यंत आनंदाने ‘श्रीं’सह घरी यावे.*
*घरी आल्यानंतर दरवाजातच थांबावे. घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी त्या मूर्तीवरून ओवाळून बाहेर ठेवावी व श्रीगणरायाची सोन्याने देवाचे औक्षण करावे व पतीच्या, मुलांच्या कपाळाला गुलाल लावून ‘गणेशा आपले सहर्ष आगमन असो’, असे म्हणून टाळ्यांच्या कडकडाटात श्रींना घरात घ्यावे.*
*ज्या जागी स्थापना करायची, त्या जागेवर थोडय़ाशा अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी. विशेष नोंद करावी की, कृपया श्रीगणरायाच्या मुर्तीचे मोल हे अनमोल आहे. जी मुर्ती आपणास आवडेल, ती मुर्ती आपण घ्यावी देवाची मुर्तीची किंमत (भाव) कृपया करू नये.....*
*(संकलित.)*
*उजव्या सोंडेच्या गणपती विषयी निरनिराळे समज - गैरसमज प्रचलित आहेत. शास्त्रात याविषयी काही नियम वा संकेत आहेत काय..?*
*उजव्या सोंडेच्या गणपती विषयीचे लिखाण एकत्र केले तर एक ग्रंथ तयार होईल... पण कोणत्याही धर्मशास्त्रीय ग्रंथात त्याविषयी फारसा उहापोह केलेला आढळत नाही.....*
*गणेशाच्या निरनिराळ्या ध्यानांमध्येही तसा स्पष्ट उल्लेख आढळत नाही... पण काही वृध्द, जाणकार व नि:सीम गणेशभक्तांनी दिलेल्या माहीतीवर अवलंबून रहावे लागते. गणेशपंथी साधक गणपती देवतेचा अतिसूक्ष्म विचार करताना आढळतात. त्यांच्या मते पार्वतीने तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार होय. तिने मृत्तिकेचा आकार करून त्यात महागणपतीचे आवाहन केले. जगदुत्पत्ती होण्यापूर्वी निर्गुण व कुटस्थ स्वरूपात असलेल्या महत्वास ते महागणपती म्हणतात. त्यानेच विविध प्रसंगी विविध प्रकारचे अवतार घेऊन दुष्टांचा संहार व सुष्टांचा प्रतिपाळ केला. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणेशावतार व इतर सात महागणपती होत असे सांगितले जाते.....*
*महागणपती जेव्हा विशिष्ट सिध्द किंवा निखळ मोक्षप्राप्ती स्तव आराधिला जातो तेव्हा उजवीकडे सोंड असलेला गणपती घेण्याची प्रथा आहे... पण अशा वेळी तो शक्यतो पार्थिक गणपती असतो. काही सोन्या-चांदीच्या उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्ती क्वचित आढळतात. पण उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमागील कामना उच्चस्तरीय असल्यामुळे कडक सोवळे, घरात अत्यंत पवित्र आहार, दररोज मोदक नैवेद्य इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. पण ही भक्ती बऱ्याच वेळा प्रीतिपोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्यातून अपसमजुती प्रचलित होतात. कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो इत्यादी अंधश्रद्धा त्यातूनच फैलावल्या आहेत.....*
*कडक आचार न पाळल्यास फार तर देवमूर्तीतील देवत्व कमी होईल, पण तथाकथित अतिरंजित परिणाम होणार नाहीत... कारण तसा शास्त्राधारही नाही व अनुभवही नाही. ज्या घरात उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आहे, तेथे काही उपद्रव असतीलच तर त्यामागे कारणेही तशीच निरनिराळी असतात. त्यासाठी गणपतीला जबाबदार धरण्यात काहीच अर्थ नसतो.....*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
*मनःशांती*
एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते.
विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे?
सस्मित चेहर्याने विष्णूंनी उत्तर दिले, 'तू अजिबात चिंता करू नकोस. मजजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.'
लक्ष्मीने विचारले, 'सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.' विष्णू म्हणाले, 'तिचं नाव आहे शांती' जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे.
उभ्या गौरी*
तुमच्याकडे उभ्याच्या गौरी आहेत न ग, बापरे केवढं करावं लागतं-असे dialogue ऐकू यायला लागले की समजावं की गौरी, गणपती जवळ आलेत
गणपती कितीही दिवस असला तरी बाप्पाना आपले मोदक केले की झालं, ते काही बिचारे एवढं सगळं मागत नाहीत 😊. मोदकाचा नैवैद्य मिळाला की खूष.
ज्यांच्या सासर माहेरी उभ्या गौरी असतात त्यांचं लग्न झालं की सासूबाईचा dialogue ठरलेला, यावेळी मदतीला आहे ही, नाहीतर मी एकटीच करत होते. दुसरीकडे आई चिंतेत. आता माझं कस होणार?
ज्यांच्या सासरी उभ्या गौरी असतात आणि माहेरी नाही, त्यांना ह्या गौरी जेवणाची इतकी भिती असते काही विचारू नका.पण पहिलं वर्ष झालं की मग त्यापण सरावतात.
ज्यांच्या फक्त माहेरी उभ्या गौरी असतात आणि सासरी नाही, त्यांची मजा. 2 दिवस माहेरपण फिक्स. हौस भागते पण जबाबदारी आई घेते.आहे न मजा.
उभ्या गौरी म्हणलं की तयारी काही विचारू नका. सगळ्यात आधी एक दोन महिने कपाटातल्या साड्या हुडकायला सुरवात होते. कुठली साडी नेसवायची? कसबस 1 साडी आपण निवडतो आणि दुसरीच्या खरेदीला बाहेर पडतो. दुकानात जाताना ती घरची साडी बरोबर नेतो सुद्धा. अहो ह्याला जोडी शोभेल अशी दाखवा अशी पहिली मागणी दुकानदाराला केली जाते. हळूहळू साड्यांचा ढीग पडतो पण जोडी मनास येत नाही. मग बहुदा बरोबर आलेली मैत्रीण म्हणते की अग त्यापेक्षा दोन्ही नव्याच घे की.🤔मग मनातल्या मनात हिशोब सुरू . एकदाच असतात गौरी वर्षातून ,होउदे खर्च , तेवढीच आपल्या आवडीची साडी घेता येईल. एक नणंदेला देऊ ती पण खूष. अशी एकदा मनासारखी साडी झाली की मग जरा मूड येतो. नंतर गौरीची सवाष्ण , तिची शोधाशोध. प्रत्येकीला आपल्या माहेरी जायचं असत किंवा स्वतःकडे तरी असतात , त्यामुळे आधी बुक करावी लागते, आणि दोनदोन वेळा फोन करून आठवण पण करून द्यावी लागते.हे कधी जेव्हा नणंद बाहेरगावी असेल तरचा प्रश्न.
घर आवरणे,बाकीची तयारी हे सर्व 2, 3 दिवस आधी होत. गणपतीचे दोन दिवस मग आरास, मोदक ह्यात जातात. ते झालं की मग खरा जोर येतो गौरीच्या तयारीसाठी.
कितीही प्लॅंनिंग केलं तरी आयत्यावेळी काहितरी धावत जाऊन आणावच लागत.
आणि finally गौरी यायचा मुहूर्त बरोबर गाठला जातो. साड्या नेसवण फार कठीण. एखादंवेळी अर्ध्यातासात होणार काम कधीकधी 2 तास लावून जात. मग मनात नाना विचार, काही चुकलंय का यंदा, अस कस होतंय? तेवढ्यात मदतीला हक्काची शेजारीण / जाऊ किंवा नणंद येते आणि वहिनी तुम्ही बसा 5 मिनिटं मी करते अस म्हणते आणि झटकन गौरी बसतात. खर तर त्या उभ्या असतात, पण म्हणताना आपण बसल्या असच म्हणतो,☺ .मग रात्री फोनवर बोलायला वेळ नसला तरी गौरी कधी बसल्या ह्या चौकशीसाठी आलेला फोन सर्व कहाणी सांगूनच ठेवला जातो.
प्रत्यक्ष गौरी जेवणादिवशी तर विचारूच नका. प्रत्येक जण 10 हाताच काम करत असते.एकीकडे तोंडाचा पट्टा पण चालू. कामवाल्या मावशीपण सुट्टीवर, त्यांच्या गौरीं साठी , हाल विचारू नका.
पण मूलं जरा लांबच असतात आईपासून. त्यादिवशी त्यांचा कुठलाही हट्ट पुरवला जाणार नाही हे त्यांनाही पक्के ठाऊक असते . गौरीजेवण, एकच लक्ष्य.
सर्व तयारीमुळे जेवण यथासांग पार पडत.
पण हे होईतो 4 वाजतात. मग संध्याकाळची तयारी. दहा मिनिटे बसावं असा विचार येतो आणि तितक्यात कोणीतरी चारलाच येत. बर बोलणार काय?सगळ्याना आपणच संगीतलेलं की कधीही या हो सोयींनी. आपला पूर्ण अवतार.मग तसंच हसून स्वागत. रात्री 9 ला मधेच आरती करून, मुलांना जेवायला घालायचं.ती पण कंटाळलेली आणि पूर्ण दिवस सगळीकडे उधळून दमलेली.
11 ला मात्र सर्व अवसान संपत आणि पाठ टेकली जाते, ओट्यावरचा पसारा दिसत असूनही कानाडोळा करतो. आडवं पडलं तरी सगळे येऊन गेलेल्या लोकांची आठवण काढतच झोप लागते, अगदी समाधानाने.
गौरीची पाठवणी मात्र दरवर्षी डोळे ओले करून जाते. परगावी सासरी निघालेली लेक आणि गौरी यात अगदी साम्य.प्रत्येकवेळी जाताना मन तेवढंच हळवं होत. विसर्जनाला जाताना पाय रेटतच जातो बहुतेक वेळा.
खर सांगू का , मी गौरीच्या हळदी कुंकवाला जाते ते त्या मुखवट्याच्या गौरी पाहायला नाही तर त्या गौरी मनापासून सजवणाऱ्या आणि त्यासाठी दिवस रात्र खपून दमल्या तरीही अगदी उत्साहाने स्वागत करणाऱ्या सर्वांनसाठी. अस वाटत खऱ्या गौरी देखील पृथ्वीवर एक दिवस येत असाव्यात आणि पाय निघत नसेल म्हणून 3 दिवस यांच्याबरोबर रेंगाळतात.
स्नेहल गोखले ( रूपा रानडे)
वरील गौरी..... जिराफे आर्टस यांच्या सौजन्याने
सदानंद राणे उर्फ ब्रह्मानंद गाणे..
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
*दक्षाला राज्यप्राप्ती* | *भीम राजास पुत्र प्राप्ती*
भृगु ऋषी सोमकांत राजाला दक्षाचा पुढील वृत्तांत सांगू लागले.
मुद्गल ऋषिंनी दक्षाला ॐ या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्यानंतर त्याने आपल्या मातेसह कौंडण्यपूर जवळील अरण्यात असलेल्या एका देवालयात वास्तव्य केले. तो गणेशाची नित्यनेमाने षोडशोपचारे मानस पूजा करीत असे. ॐकाराचा अखंड जप हे त्याचे नित्य साधन होते. अशा प्रकारे त्याच्याकडून बारा वर्षे एकवीस दिवसाचे अनुष्ठान पूर्ण झाले. त्या रात्री झोपलेला असताना दक्षाला एक स्वप्न दृष्टांत झाला. त्यात एका शृंगारलेल्या हत्तीने त्याच्या गळ्यात मौल्यवान रत्नमाळ घातली. मग त्याने त्याला सोंडेने अलगद उचलून आपल्या पाठीवर ठेवले आणि त्याला एका सुशोभित नगरात घेऊन गेला, असे दृश्य दिसले. या स्वप्नदृष्टांताने दक्षाला एकदम जाग आली. त्याचे मन प्रसन्न झाले.
त्याने हे स्वप्न आपल्या मातेला सांगितले तेव्हा तिलाही आनंद झाला. ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, “हा तर मोठा शुभशकुन आहे. हत्ती म्हणजेच गणपतीचे प्रतीक, त्याने तुला रत्नमाला घातली. याचा अर्थ श्री गजाननाच्या कृपेने लवकरच तुला राज्यप्राप्तीचा योग आहे, ते जाणवते.” हे ऐकून दक्षालाही आनंद झाला. तो म्हणाला, “आई, तू लहानपणापासून माझी किती सेवासुश्रुषा केलीस. राणी असूनही तुझ्यावर भिक्षान्नवर जगण्याची वेळ आली. मला राज्यप्राप्ती झाली तर मी तुला अखंड सुखात ठेवीन. तुला उत्तम वस्त्रालंकार, राहण्यासाठी सुशोभित महाल अशी सर्व व्यवस्था करीन.” दक्षाचे बोलणे ऐकून कमला म्हणाली, “बाळा, तू राजपुत्र आहेस. गणपती हा तुझा भाग्यविधाता आहे. पण सत्ता संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त झाले तरी उन्मत्त होऊ नकोस. न्याय, नीतीधर्माने प्रजा पालन कर. सदैव पुण्यकर्मरत रहा. गणपतीची तुझ्यावर अखंड कृपा राहो. तुला उत्तम आयु आरोग्य प्राप्त होवो.”
काही दिवसांनी कौंडण्यपूरचा राजा मरण पावला.तो निपुत्रिक होता. त्याच्या मृत्युने राणी सुलभा, प्रधान सुमती व मनोरंजन, राजपरिवार व प्रजानन शोकग्रस्त झाले. राजांनी आपला उत्तराधिकारी नेमलेला नव्हता. राजसिंहासन रिकामे ठेवणे हे ही योग्य नव्हते. गादीवर कोणाला बसवावे असा राणीला व राजाच्या एकनिष्ठ सेवकांना प्रश्न पडला होता. योगायोगाने त्याच समयी मुदगल ऋषींचे कौंडण्यपूरात आगमन झाले. ते म्हणाले, “सुमंता, तुमच्या राजाचा ‘महान’ नामक एक हत्ती आहे. तू त्याच्या सोंडेत एक रत्नमाला दे. त्याला नगरातून फिरवून आण. तो हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला तुम्ही सन्मानाने राज्याभिषेक करा.” मुद्गल ऋषींचा सल्ला सर्वांना आवडला.
मग एका शुभदिनी, शुभमुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीच्या सोंडेत राणीने रत्नमाला दिली. ती हत्तीला उद्देशून म्हणाली, “महाराजांचे तुझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्या नंतर कौंडण्यपुराच्या राजसिंहासनावर जो पुरुष बसण्यास योग्य असेल त्याच्याच गळ्यात तु ही रत्नमाला घाल, अशी माझी तुझी विनंती आहे.” राजाची निवड होणार म्हणून लोकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्या हत्तीने आपल्याच गळ्यात माळ घालावी असे प्रत्येकाला वाटत होते. प्रधानांनी हत्तीला राजवाड्यातून समारंभपूर्वक बाहेर काढले. त्याला नगरातून फिरवले, पण त्याने कोणाच्याही गळ्यात रत्नमाला घातली नाही. मग तो अरण्यात प्रवेशला. तेथे दक्ष गणेश पूजनात मग्न होता. हत्तीने ती रत्नमाला त्याच्या गळ्यात घातली. ते पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
हा काय प्रकार आहे हे दक्षाला समजेना. प्रधानांनी पुढे येऊन त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली आणि राजसिंहासन स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा दक्षाला खूपच आनंद झाला. अशा प्रकारे त्याला स्वप्नदृष्टांताची प्रचिती आली. श्री गजाननाच्या कृपेने हे सर्व घडून येत आहे म्हणून त्याने आपल्या आराध्य दैवताला कृतज्ञतेने नमस्कार केला. हा नवीन राजा तपस्वी आणि भाविक आहे, हे पाहून प्रधानांना परम संतोष वाटला. त्या मंगल प्रसंगी दक्षाला आशीर्वाद देण्यासाठी मुद्गल ऋषी स्वतः उपस्थित होते. हे वृत्त दक्षाच्या पित्याला समजले. तो ही लवाजम्यासह आपल्या पत्नीला व पुत्राला भेटण्यास आला. त्याने पूर्वकृत्यांबद्दल त्या दोघांची क्षमा मागितली. तेव्हा दक्ष हा राजपुत्र आहे या वृत्ताने प्रजाजनांना खूपच आनंद झाला. दक्षाच्या राज्यप्राप्तीनंतर त्याने वीरसेनेच्या कन्येशी थाटात विवाह केला. या दांपत्यास बृहद्भानु नावाचा पुत्र झाला, त्याला हलधर, हलधराला सुशील, सुशीलास पद्माकर, पद्माकरास रिपूमर्दी, रिपूमर्दिस चित्रसेन व चित्रसेनाला भीम हा पुत्र झाला. विश्वामित्रांच्या मुखातून आपल्या पूर्वजांची कथा, वंशपरंपरा जाणून भीम राजास खूपच आनंद झाला.
विश्वामित्रांनी त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि राज्यात परत जाण्यास सांगितले. एका शुभदिनी भीम राजाने विश्वामित्रांनी सांगितल्याप्रमाणे गणेश अनुष्ठानास प्रारंभ केला. काही दिवसांनी गणपतीने त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले. काही कालावधीनंतर राणी गर्भवती राहिली. तिने एका तेजस्वी आणि देखण्या पुत्रास जन्म दिला. राजाने पुत्रजन्माप्रित्यर्थ महोत्सव केला. बाराव्या दिवशी राजपुत्राचे थाटामाटात बारसे केले. त्याचे रुक्मांगद असे नाव ठेवले.
श्री गणेश पुराण कथा (ब)*
*रुक्मांगदाची कथा*
भीम राजाचा पुत्र रुक्मांगद हा रूपवान व गुणवान होता. आपल्या सुशील स्वभावामुळे तो सर्वांना आवडत असे. कुशाग्र बुद्धी लाभलेल्या रुक्मांगदाने आपल्या आचार्यांकडून सर्व विद्या व क्षत्रियांना आवश्यक असलेले युद्धतंत्र लवकरच आत्मसात केले. तो आपल्या पित्याप्रमाणे गणपतीची भक्ती करत असे. भीम राजाने त्याला एकाक्षरी मंत्राचा उपदेश केला. एके दिवशी रुक्मांगद आपल्या सेवकांसह हरणाच्या शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्यावेळी झालेल्या धावपळीने तो अगदी थकून गेला. विश्रांतीसाठी चांगले ठिकाण शोधत तो एका आश्रमापाशी आला. तो वाचक्नवी ऋषींचा आश्रम होता. त्यावेळी ते ऋषी स्नानासाठी निघालेले होते. ऋषींनी त्याला विश्रांती घेण्याची अनुमती दिली. आपली पत्नी मुकुंदा हिला त्याचे आदरातिथ्य करण्यास सांगितले. रुक्मांगदाला खूपच तहान लागली होती. त्याने मुकुंदाला पाणी देण्याची विनंती केली.
त्यावेळी त्याच्या देखणे, राजबिंडे रूप पाहून तिच्या मनात जबरदस्त काम वासना उत्पन्न झाली. त्याच्याकडे अर्थपूर्ण मादक दृष्टी टाकून म्हणाली, “हे राजपुत्रा, माझे मन तुझ्यावर अनुरक्त झाले आहे. माझ्या देहाला कामाग्नीने पुरते व्यापून टाकले आहे. तू माझ्याशी सहवास करून मला तृप्त कर.” एका तपस्व्याच्या पत्नीच्या मुखातील हे विपरीत शब्द ऐकून रुक्मांगदाला आश्चर्य वाटले. तो तिला म्हणाला, “वाचक्नवी हे थोर ऋषी आहेत. त्यांची योग्यता फार मोठी आहे. तू त्यांची पत्नी असूनही व्यभिचार करु पाहतेस? हे काही योग्य नाही.” रुक्मांगद जाण्यासाठी वळला. तेव्हा मुकुंदा धावतच त्याच्यापाशी आली आणि म्हणाली, “हे देखण्या वीरा, पुरुषावर अनुरक्त झालेली स्त्री स्वच्छेने त्याच्या स्वाधीन होत असेल तर कर्तव्य म्हणून त्याने तिचे कामेच्छा तृप्त करणे यात काही पाप नाही. तू माझ्या भावनेचा अनादर करू नकोस. अन्यथा मी तुला शाप देईन.”
मुकुंदाच्या निर्लज्ज वागण्याचा पापभिरू रुक्मांगदास खरोखरच राग आला. त्याने परखड शब्दात तिची निंदा केली. त्याने असे झिडकारल्यामुळे तिचा संताप अनावर झाला. ती क्रोधावेशाने म्हणाली, “दुष्टा, माझी अवहेलना केलीस! तुझ्या सर्वांगावर श्वेतकुष्ट उत्पन्न होईल.” ती शापवाणी ऐकून रुक्मांगद अतिशय व्यथित झाला. तो आश्रमाबाहेर आला, तेव्हा त्याचे शरीर श्वेतकुष्टाने पांढरेशुभ्र व कळाहीन झाले होते. तो गजाननाला आर्ततेने आळवू लागला, “हे गजानना, तू सर्वसाक्षी सर्वेश्वर आहेस. हे दयाघना! माझा काहीही अपराध नसताना मला हे दुःख का प्राप्त झाले? मला शाप देणार्या त्या निर्लज्ज कामपिपासू स्त्रीला तू जिवंत कसे ठेवलेस? आता मला जगण्यात रुची नाही. मी प्राणत्यागच करतो.”
आमरण उपोषणाचा निश्चय करून रुक्मांगद निबीड अरण्यात प्रवेशला. एका विस्तृत वटवृक्षाचा त्याने आश्रय घेतला. गजाननाचे नाव घेत निराहार राहून तो कालक्रमणा करू लागला. एके दिवशी ब्रह्मर्षी नारद त्या वनातून जात असताना हा राजपुत्र त्यांच्या दृष्टीस पडला. ते त्याच्या जवळ गेले, त्याची विचारपूस केली. रुक्मांगदाने त्यांना वंदन केले. त्यांना आपली दुर्दैवी हकिकत सांगितली. ती ऐकून नारदांना ही वाईट वाटले.
मार्गदर्शनपर बोलताना ते त्याला म्हणाले, “राजपुत्रा, मी सर्वत्र संचार करतो हे तुला माहीतच आहे. विदर्भातील कदंब नगरात चिंतामणी गणेशाचे प्राचीन आणि प्रसिद्ध असे मंदिर आहे. त्या समोरील प्रांगणात एक पवित्र जलकुंड आहे. तेथे श्री गणेशाची पावले उमटलेली आहेत. मी तेथे गेलो असताना एक क्षुद्र जातीचा वृद्ध तेथे आला. तो कुष्ठरोगाने गलितगात्र झाला होता. त्या कुंडातील जलाने त्याने स्नान केले तर काय आश्चर्य त्याच्या कुष्टरोगाचे समूळ निर्मूलन होऊन तो तेजस्वी दिसू लागला. तुही त्या ठिकाणी जावे असे मला वाटते. त्या कुंडात स्नान करून तू संकट मुक्त होशील.” नारदांचे बोलणे ऐकून रुक्मांगदास हायसे वाटले. त्या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा त्याने प्रकट केली. तेव्हा नारद त्याला त्या क्षेत्राची कहाणी सांगू लागले.
श्री गणेश पुराण कथा (क)*
*अहिल्येस व इंद्रास शाप*
नारद एकदा इंद्राला भेटण्यासाठी अमरावतीस गेलो होतो. इंद्राला भेटून नारद इंद्रास म्हणाले, “हे देवेंद्र, काही दिवसांपूर्वी मी गौतम ऋषींच्या आश्रमात गेलो होतो. त्यावेळी ते आपल्या पत्नीशी अहिल्येशी काही बोलत होते. तिचे अनुपम लावण्य पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो. स्पष्टच बोलायचे झाले तर तुझ्या दरबारातील अप्सरा ही तिच्यासमोर निस्तेज ठरतील. त्रिभुवनातील कोणत्याही सौंदर्यवतीची तिच्याशी तुलनाच होऊ शकत नाही.” नारदांच्या वर्णनानेच इंद्राच्या मनात अहिल्येची अभिलाषा निर्माण झाली. तिची प्राप्ती कशी होईल? या एकाच विचारात तो गढून गेला.
तो भूलोकी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ आला. त्यावेळी ते ऋषिवर्य स्नानसंध्यादी नित्यकर्मांसाठी आश्रमाजवळील नदीवर गेले होते. इंद्रासाठी ती एक सुसंधी होती. त्याने गौतमाचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला. अहिल्येच्या सौंदर्याने त्याचे मन ताब्यात राहिले नाही. त्याने तिला आलिंगन दिले व अंगसंगाची मागणी करू लागला. तेव्हा अहिल्या म्हणाली, “स्वामी, तुमचे हे वागणे पाहून मला अगदी आश्चर्य वाटत आहे. आपल्या इच्छेप्रमाणे वागणे हे माझं कर्तव्य असले तरी समागमासाठी ही योग्य वेळ नाही. तुमचे अजून स्नान व्हायचे आहे.” तेव्हा गौतम रुपी इंद्र म्हणाला, “प्रिये, आज माझ्या मनाची विलक्षण अवस्था झाली आहे. मी स्नानासाठी नदीवर गेलो होतो, तेथे एक अप्सरा विवस्त्र स्नान करत होती. तिला पाहून मी कामातूर झालो. काय करावे हा मोठा प्रश्न पडला.” संयमी गौतमाचे असे वागणे तिला कधीच अपेक्षित नव्हते. तरीही पतिव्रतेचा धर्म म्हणून ती त्याच्याशी रममाण झाली. सहवासानंतर त्याच्या अंगाला येणाऱ्या दिव्य सुगंधाने अहिल्याचे मन साशंक झाले.
तिच्या तत्काळ लक्षात आले. ती संतापाने ओरडून म्हणाली, “अरे नराधमा, तू कोण आहेस? तू माझ्या पती रूपात येऊन माझे पातिव्रत्य भंग केलेस! मुकाट्याने आपले मूळ स्वरूप प्रकट कर, अन्यथा मी तुला शापाने भस्मसात करीन.” अहिल्याचे ते क्रोधावेशपूर्ण भाषण ऐकून इंद्र भयभीत झाला. निज स्वरूपात प्रकट कट होऊन तो तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच वेळी गौतमाचे आश्रमात आगमन झाले. अहिल्येने त्यांना बसण्यासाठी आसन मांडलेले नव्हते, त्यांना पाय धुण्यासाठी पाणी घेऊन आली नव्हती. या सर्व गोष्टींचे त्यांना नवल वाटले. त्यांनी तिला हाक मारली. ती भयभीत होऊन त्यांच्यासमोर आली. ती थरथर कापत होती. घडलेली सर्व हकीकत तिने त्यांना कथन केली. ती ऐकून गौतमांना भयंकर संताप आला. त्यांनी तिला शाप दिला, “माझ्यासारख्या तपस्व्याची पत्नी असूनही तुला या दुष्ट इंद्राचे कपट ओळखता आले नाही? तुझी बुद्धी दगडासारखी जड आहे, म्हणून तू शिळा होऊन पडशील. तुला क्षमा करणे मला शक्य नाही, तथापि केवळ दयेपोटी मी तुला उ:शाप देतो. रामावतारात श्रीहरीच्या पावन पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल.” त्या महातपस्वीच्या शापाने अहिल्या क्षणार्धात शिळा होऊन पडली.
त्यावेळी इंद्र घरातच लपला होता. अहिल्याची अवस्था पाहून आता आपली धडगत नाही या विचाराने तो पुरता हादरुन गेला. संतापलेल्या गौतमाने त्याला हि शाप दिला. ते म्हणाले, “तू देवांचा अधिपती आहेस, म्हणून मी तुझा नाश करीत नाही. पण तुझ्यासारख्या हीन कृत्य करणाऱ्याला शासन हे झालेच पाहिजे म्हणून ज्या कामवासनेने प्रेरित होऊन तू माझ्या पत्नीला भ्रष्ट केलेस, त्या पापाबद्दल तुझ्या सर्वांगाला सहस्त्र भगे पडतील.” गौतमाच्या शापाने इंद्राच्या सर्वांगावर खरोखरच सहस्त्र भगे पडली. तो विद्रूप दिसू लागला. त्याला पश्चाताप होत होता. मग कीटकाचे रूप घेऊन तो कमळाच्या देठात लपून बसला.
हे वृत्त कळताच नारद त्वरेने अमरावतीस गेले. बृहस्पती आणि सर्व देवांना इंद्राच्या बाबतीत काय घडले आहे ते सर्व सांगितले. त्यामुळे देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली. ते सर्वजण गौतम ऋषीच्या आश्रमात आले. त्यांनी गौतमांना वंदन केले. त्यांची स्तुती केली. देव म्हणाले, “हे मुनी आपण इंद्राला क्षमा करून त्याला उ:शाप द्यावा अशी आमची विनंती आहे.” गौतम ऋषि म्हणाले, “भोगविलासी इंद्राने माझ्या पत्नीला कपटाने शीलभ्रष्ट केले. या त्याच्या अपराधाला मी क्षमा करू शकत नाही. तथापि तुमच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी मी एक उपाय सांगतो. इंद्राने गणपतीची आराधना करावी. मी तुम्हाला एक षडक्षरी मंत्र सांगतो. त्याचा तुम्ही इंद्राला उपदेश करा. श्री गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने या मंत्रानुष्ठाने त्यांची उपासना करावी. त्याला अंगावर जेथे-जेथे भघे पडले आहे, तेथे डोळे येतील. लोक त्याला सहस्त्राक्ष म्हणून ओळखतील.”
त्यानंतर देवांनी इंद्राची भेट घेतली. हताश इंद्र क्षतानी भरलेले दुर्गंधीयुक्त शरीर घेऊन त्यांच्या समूह प्रकट झाले. बृहस्पतीने त्याला गौतमाकडील सर्व वृत्तान्त सांगितला. त्याला गणेशाय नमः या मंत्राचा उपदेश केला. पश्चातापाने पोळलेल्या इंद्राने दृढश्रद्धेने व भक्तीने अनुष्ठान आरंभले. तो एकाग्रतेने मंत्रजप करू लागला. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्याच्या शरीरावरील भघे नाहीशी होऊन त्याला सहस्त्र नेत्र असलेला दिव्य देह प्राप्त झाला. या चमत्काराने इंद्राची गणेश भक्ती अधिकच दृढ झाली. इंद्र एका वृक्षाखाली बसून षडाक्षरी गणेश मंत्राचा जप करू लागला. एकाग्रतेने त्याचे देहभान हरपले. अशी हजारो वर्षे लोटली. इंद्राचा देह वारुळाने व्यापून गेला. या त्याच्या तपश्चर्येने श्री महागणपती प्रसन्न झाला. ते इंद्रासंमुख प्रकट झाले.
त्याने डोळे उघडून पाहिले. आपल्या आराध्य देवतांची ती महन्मंगल प्रसन्न मूर्ती पाहून त्यास परमानंद झाला. त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला. त्याची भक्तिभावाने स्तुती आरंभली, “हे दयाघना, हे भक्तवत्सला, शिवनंदन शक्तीसुता! तुझ्या दर्शनाने मी धन्य धन्य झालो आहे. तु आनंदाचा सागर आहेस. तू कृपेचा मेघ आहेस. मला तुझे कधीही विस्मरण न होवो, एवढीच प्रार्थना आहे. तुझ्या मनात मला काही द्यायचेच असेल तर, माझे एवढेच सांगणे आहे की ज्या कदंब वृक्षाखाली बसून मी तपश्चर्या केली. तेथे आठवण म्हणून एक नगर निर्माण व्हावे. ते कदंबनगर म्हणून प्रख्यात व्हावे. या सरोवरात स्नान करून मी देवगुरु बृहस्पती कडून तुझ्या षडाक्षरी नाममंत्राचा उपदेश घेतला ते चिंतामणी सरोवर या नावाने प्रख्यात व्हावे आणि त्यात स्नान करून दानधर्म करणाऱ्याच्या सर्व इष्ठ मनोकामना तुझ्या प्रसादाने पूर्ण व्हाव्यात. गणपतीने ‘तथास्तु’ म्हणून इंद्राला आशीर्वाद दिला.
त्या वरदानाने इंद्राला कृतकृत्य वाटले. त्याने स्वर्गातील गंगेचे पाणी आणून गणपतीला विधीयुक्त स्नान घातले. त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्याच्या सेवेचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावले. इंद्राने त्या स्थानी एक सुरेख मंदिर बांधले. त्याच्या गाभाऱ्यात गणपतीच्या मनोहर स्पटिक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मग तो सहपरिवार स्वर्गलोकी गेला.”
नारदांनी हि कथा रुक्मांगदास सांगितली व पुढे म्हणाले, “रुक्मांगदा! असे आहे चिंतामणी सरोवराचे महात्म्य म्हणून तू कदंब नगरास जा. तेथील सरोवरात स्नान कर. त्या पुण्यतीर्थाच्या प्रभावाने तुझ्या श्वेतकुष्टाचे निवारण होऊन तुला दिव्य देह प्राप्त होईल.” रुक्मांगदाने नारदाचे आभार मानले. त्यांना साष्टांग नमस्कार केला. काही वेळाने रुक्मांगदाचा शोध घेत त्याचे सैनिक त्याच्यापाशी आले. तो सापडल्यामुळे त्यांना फारच आनंद झाला होता. तथापि श्वेतकुष्टामुळे त्याला विरूप अवस्थेत पाहून त्यांना फारच दुःख झाले. त्याने कदंब नगरात चिंतामणी सरोवराकडे जाण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा सर्व एकनिष्ठ सैनिक त्याच्या समवेत जाण्यास निघाले. मजल दरमजल करीत रुक्मांगद चिंतामणी सरोवरापाशी गेला. गजाननाचे स्मरण करून सर्वांनी त्या तीर्थ ठिकाणी स्नान केले, तर काय आश्चर्य! राजपुत्राच्या अंगावरील श्वेतकुष्ठ नाहीसा होऊन त्याची काया पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागली. सैनिकांचे शरीरही उजळले. त्यामुळे सर्वांना फारच आनंद झाला.
मंदिरात जाऊन गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्याची पूजा केली. तेवढ्यात आकाशातून एक तेजस्वी विमान खाली आले. त्या विमानात गणेश दूत होते. रुक्मांगदाने त्या सर्वांना वंदन केले. तेव्हा दूत म्हणाले, “तुमची श्रद्धा भक्ती पाहून आमचे स्वामी तुमच्यावर इतके प्रसन्न झाले आहेत की त्यांनी तुम्हा सर्वांना गणेशलोकी नेण्यासाठी हे विमान पाठवले आहे. तरी कृपा करून आमच्या समवेत चला.” ते ऐकून रुक्मांगदास परमानंद झाला. तो गणेश दूतांना म्हणाला, “हे गणांनो, तुम्ही मला नेण्यासाठी येथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. पण मला क्षमा करा. यावेळी मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. घरी माझे आई-वडील आहेत. त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय तुमच्या बरोबर येणे मला शक्य नाही.”
रुक्मांगदाला माता-पिता विषयी असलेली आस्था पाहून दूतांना परम संतोष वाटला. ते म्हणाले, “हे राजपुत्रा, तु खरोखरच सद्गुणी आहेस. या तीर्थात तू पुन्हा स्नान कर, त्या स्नानाचे पुण्य तुझ्या माता पितरांना अर्पण कर. म्हणजे आम्ही तुझ्याबरोबर त्यांनाही गणेशलोकी घेऊन जाऊ.” चिंतामणी सरोवरात स्नान करून त्याचे पुण्य त्याने आपले माता पिता व सर्व पौरजणांना अर्पण केले. मग तो आपल्या सैनिकांसह विमानात बसून कौंडण्य नगरात आला. त्याच्या स्नान पुण्यादानाने प्रसन्न झालेल्या श्रीगणपती ने आणखी अनेक विमाने तेथे पाठवली. रुक्मांगद आपले माता पिता, आप्तमित्र व सर्व नागरिकांसह विमानात बसून गणेशलोकी गेला. अशा प्रकारे श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने रुक्मांगदाचा, त्याच्या परिवाराचा व त्याच्या नागरिकांचा उद्धार झाला.
श्री गणेश पुराण कथा (ड)*
*गृत्समदाची कथा*
ब्रह्मदेव म्हणाले, “हे मुनि, रुक्मांगद निघून गेल्यावर प्रणयातुर मुकुंदेस जराही चैन पडेना. कामाग्नीने तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. काही केल्या रुक्मांगदाचे देखणे स्वरूप तिच्या डोळ्यासमोरून दूर होईना. आपण त्याला अकारण शाप दिला याचाही तिच्या मनात रुखरुख होती. एके दिवशी ती अरण्यातील एकांतात रुक्मांगदाची आठवण काढत बसली होती. इंद्राने तिची मनोव्यथा ओळखली. त्याने रुक्मांगदाचे रूप घेऊन तिच्याशी सहवास केला आणि तो अदृश्य झाला. हे सर्व स्वप्नच असावे अशी समजूत झाल्यामुळे मुकुंदाच्या मनात इंद्राबद्दल कधीच संशय आला नाही. या प्रसंगानंतर ती गर्भवती राहिली. वाचक्नवी ऋषींना या गोष्टीची काहीच माहिती नव्हती. प्रसुतीकाळ पूर्ण होताच मुकुंदेने एका पुत्राला जन्म दिला. वाचक्नवीना पुत्रप्राप्तीचा फारच आनंद झाला. तो आपलाच पुत्र आहे या भावनेने त्यांनी त्याचे जातककर्म केले. त्याचे गृत्समद असे नामकरण केले. गृत्समद तेजस्वी आणि विलक्षण बुद्धिमान होता. वाचक्नवी ऋषींनी उपासनेसाठी त्याला *गणानां त्वा.* मंत्राचा उपदेश केला. या मंत्राने आराधना केल्यावर गणपती तुझ्यावर प्रसन्न होईल, तो तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करेल असा त्याला आशीर्वाद दिला.
मगध राजा महापराक्रमी, सर्वगुणसंपन्न आणि ज्ञानी होता. त्याने पितृश्राद्धाच्या निमित्ताने वयोवृद्ध, तपोवृद्ध अशा अनेक ऋषींना बोलावून घेतले होते. अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र ऋषी तेथे उपस्थित होते. त्यात गृत्समद हि होता. त्या विद्वज्जनांत त्याने काही सिद्धांतावर आत्मविश्वासपूर्वक आपली मते मांडली. तेव्हा अत्री ऋषींनी त्याचा निषेध केला. ते म्हणाले, “गृत्समदा, तुझ्यासारख्या ने आमच्यासमोर असे अभिमानाने बोलणे योग्य नाही. तू वाचक्नवीचा औरस पुत्र नाहीस. रुक्मांगद नावाच्या एका राजपुत्रापासून तुझा जन्म झाला आहे. ऋषीपुत्र नसल्यामुळे तू येथून निघून जावे हेच बरे.”
अत्रि ऋषींचे बोलणे ऐकून गृत्समदाला मोठा धक्का बसला. त्याला त्यांचा मनस्वी राग आला. गृत्समद अत्रीना म्हणाला, “तुम्ही माझ्या सर्वांदेखत जो अपमान केलात, तो मी कधीही विसरणार नाही. तुमचे बोलणे असत्य ठरले तर मी तुम्हाला भस्म करेल.” गृत्समद संतापणे जळफळत त्या मंडपातून बाहेर पडला. घरी गेल्यावर मातेला पाहताच त्याचा क्रोध अधिकच उफाळला. त्याने तिला जाब विचारला. तेजस्वी गृत्समद अनिवार संतापाने थरथरत होता. त्याला पाहून मुकुंदेला कापरेच भरले. तिने अर्धवट शुद्धीत तिला पडलेल्या स्वप्नांची हकीकत सांगितली.
ते ऐकून गृत्समद म्हणाला, “कोणी परका पुरुष तुझ्याशी सहवास करून जातो, त्याला तू स्वप्न म्हणतेस. हा तर विचार व्यभिचार झाला. तू आपल्या चरित्रहीनतेने माझ्या पित्याची फसवणूक केलीच आहेस आणि मलाही लोकांमध्ये तोंड दाखवण्याची जागा ठेवली नाहीस. या पापाचे फळ तुला भोगायलाच हवे. तु काटेरी बोर होशील. तुझ्या अंगावर पुष्कळ फळे येतील, पण कोणताही प्राणी त्यांना तोंड लावणार नाही.”
ते ऐकून मुकुंदेला हि संताप आला. तिनेही गृत्समदाला शाप दिला, “मी पापीणी आहे असे तुला वाटत असले तरीही मी तुझी आई आहे हे तू विसरलास? मी किती कष्ट सोसून तुला वाढवले, हे हि तू विसरलास? बरे पांग फेडलेस. तू पाषाणहृदयी आहेस म्हणून तुझ्या मुखातून माझ्यासाठी शापवाणी निघाली. तु दुष्ट आहेस म्हणून तुझ्या पोटीही त्रैलोक्याला ला तापदायक ठरेल असा क्रूर, दुरात्मा पुत्र जन्माला येईल.” त्या दोघांनी एकमेकांना अशे शाप दिले. त्यावेळी आकाशवाणी झाली, ‘गृत्समदा हा इंद्राचा पुत्र आहे.’ ते ऐकून मुकुंदा स्तंभीत झाली. हा काय प्रकार आहे हेच तिला कळेना. तेवढ्यात तिचे काटेरी बोरीच्या झाडात रुपांतर झाले. गृत्समद हि लज्जित झाला होता. काय करावे हे त्याला सुचेना. तो आश्रमस्थान सोडून निघाला.
फिरत फिरत पुष्पक नामक अरण्यात प्रवेशला. त्याच्या पित्याने *गणानां त्वा* या मंत्राचे महात्म्य त्याला आधीच सांगितले होते. पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून त्यांने एकाग्रचित्ताने या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. हि त्याची दृढ तपसाधना पाहून गणपती प्रसन्न झाला. त्याच्यासमोर प्रकट होऊन तो म्हणाला, “गृत्समदा, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. मी तुला वरदान देऊ इच्छितो, तरी इष्ट ते मागून घे.” गृत्समदाने डोळे उघडले. समोर आपले आराध्य दैवत साक्षात उभे आहेत हे पाहून त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला व म्हणाला, “हे गणपती! मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो. ब्राह्मणापेक्षा ज्ञानी श्रेष्ठ असतो. ज्ञानी जणांपेक्षा ब्रम्हवेत्ता सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून हे देवा तू मला ब्रह्मज्ञान दे. मी देव आणि मनुष्यांना पूज्य व्हावे, तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना व्हावी अशी माझी तीव्र इच्छा आहे. मी तपश्चर्या केलेल्या या पवित्र वनात तु नित्य वास करावास आणि तुझ्या दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण करावेस असे मला वाटते.”
तेव्हा गणपती म्हणाले, “गृत्समदा, आजपासून मी तुला ब्राह्मणत्व दिले आहे. तू ब्रह्मज्ञानी होशील. *गणानां त्वा.* या मंत्राचा तूच द्रष्टाऋषी म्हणून प्रख्यात होशील. वेदज्ञ ऋषिमध्ये तुझी गणना होईल. माझ्या स्मरणापूर्वी सर्व लोक तुझ्या नावाचा उच्चार करतील. तुला एक महापराक्रमी व युद्धनिपुण पुत्र होईल. शंकराशिवाय तो सर्वांना अजिंक्य असेल. हे पवित्र क्षेत्र चारही युगांमध्ये विख्यात होईल. हे वन कृतयुगात पुष्पक, त्रेतायुगात मणिपूर, द्वापारयुगात मानक व कलियुगात भद्रक या नावाने ओळखले जाईल. या क्षेत्रात स्नान व दानधर्म करणाऱ्याच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील.” गणपती अंतर्धान पावले. गृत्समदाने तेथे गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेथे एक सुंदर मंदिर बांधले. तो गणपती वरदविनायक म्हणून प्रसिद्ध आहे.
श्रीगणेश*
भाग - ७
हजारो वर्षापुर्वीची गोष्ट! वाचक्नवी त्रृषींची मुकुंदा नावाची पत्नी होती. तिचे रुक्मांगद या महान गणेशभक्तावर प्रेम होते. तीने त्याच्याकडे शारिरीक सुखाची मागणी केली असतां, ती गुरुपत्नी असुन परस्रीगमन पाप आहे असे म्हणुन त्याने नकार दिला. तीने चिडुन तुझ्या अंगावर कोड फुटेल असा शाप दिला. शाप ऐकुन खिन्न मनाने तो निघुन गेला. पण मूकुंदा त्याच्या विरहाने कासाविस होऊन अरण्यात एकांत स्थळी बसली असता, तीला झोप लागली. हा फायदा घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रुप घेऊन तीचा उपभोग घेतला. तो इंद्र असल्याचा तीला बिलकुल संशय आला नाही.
पुढे तीला मुलगा झाला. वाचक्नवी त्रृषींना तो आपलाच मुलगा आहे असे वाटले. त्याचे नांव गृत्समद ठेवले. त्याची मुंज झाल्यावर त्याला वेद व गणानां त्वां" इत्यादी मंत्राचा उपदेश केला. गृत्समदाच्या भक्तीने प्रसन्न होऊन तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होतील असा वर दिला. त्याच्या शरिरात इंद्रदेवाचे रक्त असल्यामुळे तो तेजस्वी व बुध्दीमान होत गेला.
एकदा मगदराजाकडे श्राध्द असल्यामुळे तीथे अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र आणि गृत्समद त्रृषी उपस्थीत होते. सर्व त्रृषींची शास्रचर्चा सुरु असतांना गृत्समदाने सुध्दा अथर्वशीर्षाचा सिध्दांत सांगीतला, तेव्हा अत्रींनी त्याचा उपहास करुन त्याचे जन्मरहस्य उघड केले. संतापाने त्याने आईला विचारले माझा जन्मदाता कोण? असे विचारले असतां तीने तीच्या झोपेत घडलेला प्रकार सांगीतल्यावर त्याने संतापुन "तु काटेरी बोर होऊन तुझ्या फळांना कोणीही स्पर्श करणार नाही" असा शाप दिल्यावर, तीने सुध्दा मुलाला, तु समजुन न घेता शाप दिलास म्हणुन मी सुध्दा तुला शाप देते की, "तुझ्यापोटी राक्षस जन्म घेईल" आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली, गृत्समंद हा इंद्राचा मुलगा आहे, हे ऐकताच दोघेही गोंधळुन गेले, त्याचक्षणी तीचे बोरीत रुपांतर झाले..
गृतसमदला "गणानां त्वां" मंत्राचं स्मरण झालं आणि त्याने गजाननाची भक्ती करण्यासाठी अरण्यात जाऊन तप करण्यास सुरुवात केली. अनेक दिवस एकाग्र मनानं गजाननाचं चिंतन! ध्यान करत पायाच्या एका अंगठ्यावर जप करत उभा राहिला. अनेक वर्षे केवळ पानं भक्षण करुन तप केल. त्याची गणेशसाधना एवढी उत्कट होती की, गजानन प्रसन्न होऊन इच्छित वर मागण्यास सांगीतले.
गृत्समदनं गजाननाला विनम्रपणे साष्टांग नमस्कार करुन म्हणाला, देवा! मला ब्रम्हज्ञान व तुझ्या भक्तात माझी गणना होऊन देवांना व मानवास मी पुज्य व्हावे! असा वर द्यावा."
"तथास्तु...!" म्हणुन, ते पुढे म्हणाले! "वेदवेत्या विद्वानांमधे तुझी गणना होऊन गणानां त्वां मंत्राचा तुच द्रष्टा त्रृषी होशील, माझ्या नामाच्या स्मरणापुर्वी भक्त तुझेच नाव उच्चारतील. तुला पराक्रमी पुत्र होईल पण त्याला शंकराशिवाय कोणीच जिंकु शकणार नाही. हे क्षेत्र कृतयुगात- पुष्पक, त्रेतायुगात- मणिपुर, द्वापारयुगात-मानक आणि कलीयुगात-भद्रक नावाने प्राख्यात होईल." वर देऊन गणपती अंतर्धान पावले.
तिथे गृत्समदाने मंदिर बांधुन "वरद विनायक" या मुर्तीची स्थापना केली. एकदा त्याला आलेल्या मोठ्या शिंकेतुन लालबुंद बालक जन्माला आले, ते पाहुन त्याच्या मातेने मुकुंदाने दिलेल्या शापाची आठवण झाली. हाच तो भयंकर राक्षस, हे त्याच्या लक्षात आले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
: *श्रीगणेश*
भाग - ८.
त्या बालकाला भक्तीमार्गाकडे वळवावे असा विचार करुन गणेशाची आराधना करायला शिकवली. बालकाने गणेशमंत्राचा जप करीत कठोर तपश्चर्या केली. गणेशांनी प्रसन्न होऊन वर मागायला सांगीतले. त्यावर बालक म्हणाला, "देवा! ब्रम्हाडांवर माझं स्वामित्व राहावे, देव, मनुष्य, गंधर्व, या सर्वांनी माझ्या आज्ञेत असावं....!!"
" तथास्तु" म्हणुन गणेश म्हणाले, "मी तुला लोखंड, सोनं, रुपाचं विमान देतो, त्यात बसुन तु त्रैलोक्य जिंकु शकशील. देवादिकांना हरवशील. फक्त शंकराकडुनच तुझा पराभव होईल. तुला त्रिपुरा नांव प्राप्त होईल."
वर मिळाला तेव्हा त्रिपुर बंग देशात होता. त्रिपुराने तिथे उत्तम गणेशमंदिर बांधुन गणेशपूर नगर वसविले. गणेश वरदानामुळे बहुतेक राजे त्याला शरण आले. जे नाही आले नाहीत त्यांचा वध केला. मृत्युलोक, पाताळलोक जिंकुन इंद्राशी घनघोर युध्द केले. इंद्राचा पराभव करुन त्रिपुराने स्वर्गाचं राज्य बळकावलं. सर्व देव इंद्रासह हिमालयाच्या दर्यात लपुन बसलेत. त्रिपुरानं चंड व प्रचंड असे दोन मानसपुत्र निर्माण करुन विष्णु व ब्रम्हलोक त्यांच्या हवाली करुन स्वतः कैलास पर्वत गदागदा हलवायला सुरुवात केली. शंकराने त्रिपुराला कैलासपर्वत दान करुन पार्वतीसह मंदार पर्वतावर निघुन गेले.
त्रिपुराने सर्वत्र धुमाकुळ घातला. हिमालयात लपुन बसलेले सर्व देव भयभीत झाले. नारदाने त्या सर्व देवांना गणेशाचा ॐकाररुपी मंत्राचा जप करण्यास सांगीतले. गजानन प्रगट होऊन म्हणाले त्रिपुराचा पराभव शंकराच्या हातुनच होणार आहे. देवाचं रक्षण करण्यासाठी गणेशाने ब्राम्हणाचे रुप धारण करुन कालधर नावानं त्रिपुरसुराकडे गेले. त्रिपुराने गणेशाला विचारले, "कोणती कला येते? त्यावर गणेश म्हणाले, मी तुला शिल्पज्ञानाच्या सहाय्याने तीन विमानं तयार करुन देतो. त्या विमानाने तुला क्षणात जेथे वाटेल तेथे जाता येईल. शंकराशिवाय या विमानांचा भेद मात्र कोणालाही करतां येणार नाही." त्रिपुराला खूप आनंद झाला. त्याने त्या ब्राम्हणाला हवं ते मागायला सांगीतल्यावर गजाननाने कैलासपर्वतावर असलेली चिंतामणीची सुंदर मूर्ती मागीतली. त्रिपुराने लगेच मान्य केले.
मंदार पर्वतावर त्रिपुराच व शंकराचं प्रखर युध्द झालं. चिंतामणीची सुर्याप्रमाणे तेजस्वी, रत्नांनी सुशोभित अशी मूर्ती बघताच त्रिपुराला अत्यानंद झाला. तो मूर्ती घेऊन निघाला, पण अचानक मूर्ती त्याच्या हातुन अदृष्य झाली. त्याच मन विषण्ण झालं.
शंकराने दण्डकारण्यात जाऊन षडाक्षर व एकाक्षर मंत्राचा जप करण्यासाठी प्राणायनानं एकाग्र चित्त करुन गजाननाचं चिंतन सुरु केले. कांही काळाने पाच मुख, दहा हात! भाळी चंद्र, गळ्यात मस्तकांची माळ व सर्पभुषणं अशा रुपानं गजानन शंकरासमोर प्रगट झाले. ते शंकरही दिसत होते व गजाननही दिसत होते. शंकराने त्याची स्तुती करुन मार्ग दाखविण्याची विनंती केल्यावर गजाननाने सांगीतले, "माझ्या बीजमंत्राचा जप करुन त्रिपुरासुराच्या विमानावर बाण सोडल्यास त्याचा नाश होईल."
शंकरानं गणेशसहस्रनाम ग्रहण करुन तीथे गणेशमंदिर स्थापुन मणीपूर नांवाच नगर वसविले. गजाननानं शंकराला आणखी एकवीस नावं सांगुन त्यांचे नित्य स्मरण केल्यास सहस्रनामाचे फळ मिळेल. ती नांवे अशी...
गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, क्षिप्रसाधन, अमोधसिमृध्दी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, शिव, कश्यपनंदन,वाचासिध्द आणि दृंढिविनायक अशी ती सिध्दीदायक पवित्र नामे आहेत.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
*श्रीगणेश*
भाग - ९.
गणेशाच्या वरदानाने शंकराला आनंद झाला. परत जाऊन सर्व देवांना त्रिपुरीवर स्वारी करण्याचे अव्हाहन केले. दोन्हीकडील सैन्यात घनघोर युध्द झाले. इंद्राचा परत पराभव होण्याची वेळ आल्याने शंकरांनी चंद्र-सुर्याचा रथ करुन ब्रम्हदेवाला सारथ्य करायला दिले मेरुचं धनुष्य व विष्णुचा बाणाचा उपयोग केला. अश्विनीकुमार रथाचे अश्व झाले. गणेशाचं सहस्रनाम, आचमन प्राणायकपूर्वक म्हणुन ओंकाराचा षडाक्षराचा जप करुन त्रिपुरानाशकाचा संकल्प करुन बाण सोडल्याबरोबर त्रिपुराचे प्राण ज्योतीरुपाने शंकराच्या शरीरात प्रविष्ट झाले. राक्षसी सत्ता विलयास गेली. देवांनी शंकराला "त्रिपुरारी" नांव बहाल केले.
ती कार्तिक पोर्णिमा होती. त्या दिवशी दानवांचा पराभव आणि देवांचा विजय झाला म्हणुन या दिवशी दिपोत्सोव करण्याची प्रथा पडली. गृत्समदाला त्रिपुर नावाचा राक्षससारखा पुत्र झाला, त्याचा अहंकार नष्ट करण्याकरितां शंकराला श्रीगणेशाची आराधना करावी लागली म्हणुनच चतुर्थीशी गृत्समदाचं नांव कायमचं जोडल्या गेलं. आजही गृत्समदला गणेशाचा सर्वश्रेष्ठ भक्त मानतात.
भृशुंडी त्रृषीने गजाननाची एवढी भक्ती, आराधना केली की, तो गजाननासारखा दिसुं लागला. त्याला भेटायला व चमत्कार पहायला नारद स्वर्गातुन आलेत. पुर्वी तो नंदन शहरातील चोर होता. चोर्या, व्यभिचार, जुगारी, मद्यपी असुन नागरिकांना अतिशय त्रासदायक झाल्यामुळे त्याला रानात हाकलुन दिले होते. त्याने चिडुन तिथे वाटमार्या, प्रवाशांना लुटुन अमाप संपत्ती मिळवली होती.
एकदा तो शिकार करण्यासाठी हरणामागे धावत एका सरोवराजवळ पोहोचला . त्यानं सरोवरात स्नान केलं. ते गणेशाचे पवित्र स्थान आहे हे त्याला माहित नव्हते. तो परत जायला निघाला, तोच मुद्गलत्रृषीच्या तोंडुन "गजानन" "गजानन" असा नामघोष ऐकु आला. तो खड्ग उगारुन त्यांच्या अंगावर धावुन गेल्याबरोबर खड्ग त्याच्या हातातुन गळुन पडले. त्याला उपरती झाली. वैराग्य उत्पन्न झाले. तो शरण येऊन उध्दार करण्याची विनंती करु लागला. त्रृषिने त्याच्या मस्तकावर हात ठेवुन "गणेशाय नमः" या मंत्राचा उपदेश करुन हातातील काठी जमीनीत रोवुन म्हणाले! मी परत येईपर्यत किंवा या काठीला अंकुर फुटेपर्यत मन एकाग्र करुन दिलेल्या मंत्राचा जप कर! असे म्हणुन मूद्गलत्रृषी निघुन गेलै.
भृशुंडी चोराने वायु भक्षण करुन जपास प्रारंभ केला. काही महिण्याने काठीला नवा अंकुर फुटला तरी तो गजाननाच्या मंत्र जप करीत मुद्गलत्रृषीची वाट पाहत राहिला. त्याच्या अंगाभोवती वारुळ तयार झाले. वेलींनी अंगाला वेष्टण घातलं, तरी जप सुरुच होता. कांही काळाने मुद्गलत्रृषी परत आले, पाहतात तो काय? काठीचे रुपांतर वृक्षात झालेलं, वारुळातुन "गणेशाय नमः" असा ध्वनी ऐकु येत होता. त्यांनी वारुळ व वेली बाजुला करुन त्याच्या अंगावर कमंडलु मधील पाणी शिंपडले. चोर भानावर आला. त्याच्या भूवयांमधुन सोंड निघाली, तो गणेशासारखा तेजस्वी दिसु लागला. त्याच्या भृकुटीतुन तोंड निघाली म्हणून त्याचे नांव भृशुंडी ठेवल. त्याने गणेशमुर्तीचि स्थापना केली.
भृशुंडीत्रृषीला साक्षात गणेशाचे दर्शन देऊन तेथील मुर्तीच्या दर्शनाने मोक्ष मिळेल असा वर दिला. ते स्थान 'नामल क्षेत्र' म्हणुन प्रसिध्द झाले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
*श्रीगणेश*
भाग - १०.
कृतवीर्य नावाचा उदार, पराक्रमी राजा व पत्नि सुगंधा यांना संतान नव्हते म्हणुन त्याने राणीसह राजत्याग करुन अरण्यात झाडाची पाणं खाऊन तपश्चर्या केल्यामुळे निपुत्रिक अवस्थेत राजा मरन्नासन्न झाला आहे, असे त्याच्या पित्याला कळल्यामुळे त्याचे पिता ब्रम्हदेवाकडे जाऊन आपल्या सदाचारी पुत्राला संतान कां होत नाही? असे विचारल्यावर,ब्रम्हदेव त्याला म्हणाले, तुझ्या पुत्राने द्रव्यलोभाने बारा मानव हत्त्या केल्याने महापातकामुळे त्याला पुत्रलाभ झाला नाही, पण संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास त्याला पुत्र होऊ शकतो.
राजाने विचारले अंगारकी चतुर्थी म्हणजे काय? त्यावर ते म्हणाले, अवंती नगरातील भारद्वाजत्रृषी एकदा क्षीप्रा नदीत स्नानास गेले असतां तिथे एक अप्सरा जलक्रीडा करीत असतांना पाहिल्यावर त्यांचे विर्यपतन झालं ते पृथ्वीने धारण केलं, त्यापासुन तीला लाल रंगाचा तेजस्वी पुत्र झाला. तो बाळ सात वर्षाचा झाला तरी त्याचे शरीर लालबुंदच होते, मुलाने आईला विचारल्यावर पृथ्वीने त्याचा जन्म कसा झाला हे सांगीतले. त्यानं पित्याला भेटण्याचा हट्ट धरल्याने पृथ्वी त्याला भरद्वाजाकडे घेऊन गेली व त्याचे पालनपोषण करण्याची विनंती केली.
भरद्वाजानी त्याचा स्विकार करुन त्याची मूंज केली. वेद शिकवले, गणेश मंत्राचा उपदेश करुन अनुष्ठान करायला सांगीतले. त्याने नर्मदानदी काठी जाऊन तपश्चर्या केली. गणेश प्रसन्न होऊन त्याला वर मागायला सांगीतले. तो दिवस माघ शूध्द चतुर्थीचा होता. तो म्हणाला, मला स्वर्गात स्थान मिळावंं, माझे नांव त्रिलोकांत विख्यात व्हावं! आजची माघ वद्य चतुर्थी विशेष कल्याणकारी व्हावी! तथास्तु! भूमीपुत्र असल्यामूळे तुला भौम म्हणतील. मंगल नावही प्राप्त होईल. तु अंगारक म्हणजे अंगारासारखा लाल असल्यामुळे तेच नांव चतुर्थीला ठेवतील. एवढं म्हणुन गणेश अंतर्धान पावले. मंगलने त्याठीकाणी दशभूजा गजाननाची मूर्ती स्थापन करुन मूर्तीच नांव मंगलमूर्ती ठेवलं. तेव्हापासुन गजाननाला मंगलमूर्ती म्हणतात. म्हणुन मंगळवारी येणार्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात.
वामनभटजी हे देशस्थ त्रृगवेदी कानडी ब्राम्हण! त्यांची पत्नी पार्वतीबाई धर्मपरायण, सदाचारी होती. वामनभटजी स्वतः धर्म वेदशास्रात पारंगत होते. परंतु त्यांना संतान नसल्यामुळे व शाली गावात त्यांचा ऊदर्निवाह होत नसल्यामुळे ते मोरगांवला कर्हा नदीकाठी कुटी बांधुन राहु लागले.
सर्वांगी शेंदुर, मस्तकी नागफणा, भाळी शिवगंध, डोळ्यात, बेंबीत हिरे चमकत असलेल्या मयूरेश्वराच्या प्रसन्न देवमूर्तीचे दर्शन घेतांना दोघेही पती-पत्नीचे घटकाभर भान हरपलं. तेथील पुजाराला या मुर्तीची माहिती विचारली असतां, पुजारी म्हणाला, या क्षेत्राला मोरगांव म्हणतात. ओंकारस्वरुप गणेशाचे अवतरण पहिल्यांदा इथे झालं. या गावास गणेशसांप्रदायाच्या आद्यपीठाचा मान आहे. भूस्वानंदपूर, स्वानंदभुवन, सर्वक्षेत्र, बीजक्षेत्र, क्षेत्रराज अशा विविध नांवानी हे क्षेत्र प्रसिध्द आहे. एकदा ब्रम्हदेवाच्या कमंडलू कलंडला. त्यातुन सांडलेल्या जलौघाचीच नदी झाली. तीच ही कर्हा नदी होय.
सृष्टीनिर्मिती करावी अशी संकल्पना ओंकारस्वरुप गणेशाच्या मनात आली, त्याप्रमाणे... ब्रम्हदेव, विष्णु, शिव, पार्वती व सुर्यनारायण अशी पांच देवतं मोरगांवात दाखल झाली. परंतु गणेशाचे दर्शन न झाल्यामुळे त्यांनी ॐ या मंत्राची अनुष्ठान केलं. अखेर ओंकारस्वरुप गणेश प्रगट झाले. त्याच्या मंगल दर्शनाने पंचदेवतांच्या डोळ्यांचे पारणं फिटले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
श्रीगणेश*
भाग १.
सुमारे पांच सात हजार वर्षापुर्वी पाताळातील रत्नपुरीत काशीराजाचे राज्य होते. विद्वान कश्यपत्रृषी व पत्नि आदिती हिमालयाच्या पायथ्याशी राहत. त्यांच्या गुरुकुलात २१०० बटु शिक्षण घेत होते. ते काशीराजाचे गुरु होते. आदिती पतिव्रता असुन सुर्योपासक होती. त्यांना लग्नाच्या पांच वर्षानंतर मुलगा झाला. त्याचे नांव विनायक ठेवले. विनायक रुपाने वेगळाच होता. सावळा रंग, बारीक डोळे, हत्तीसारखे कपाळ... तरीही तो आपल्या गुणांनी सर्वांचा आवडता होता.
महर्षी पराशरने विनायकाचे भाकीत सांगतांना म्हणाले, विनायक दिसायला जरी विचित्र असला तरी मनानं अतिशय सुंदर आहे. तो आर्यभूचा नायक होऊन पराक्रमी नेतृत्व करणारा बुध्दीमान होईल. सर्व देवतांमधे याला अग्रपुजेचा मान राहिल.
विनायक सहा वर्षाचा झाल्यावर त्याच्या मुंजीसाठी अनेक त्रृषी, कैलासाहुन शंकर, स्वर्गातुन इंद्र, बद्रिकाश्रमातुन व्यास आणि पाताळातुन काशीराजही आलेत. अरुंधती, रेणुका इतर अनेक देवताही आल्यात. मौजीबंधनानंंतर विनायकाने गुरुसमोर शपथ घेतली की, वेदविद्येचा अभ्यास करीन. माता-पिता आणि गुरु यांना मान देईन. देव, देश, धर्म यासाठी प्रसंगी प्राण सुध्दा अर्पण करीन. नंतर कश्यपांनी गायत्रीमंत्र, रेणुकेने परशू, शंकराने त्रिशूल व डमरु, व्यासांनी महाभारताचा पहिला पर्व, माहेश्वरीने २१ मोदक, अश्विनीकुमारांनी २१ दुर्वा आणि सर्वांनी बटुला अशिर्वाद दिला.
नंतरच्या सहा वर्षात विनायकाने चारही वेदाचा अभ्यास पुर्ण केला. आश्रमातील सर्व प्रकारची कामे मग ती कोणत्याही दर्जाची असो मनोभावे करीत असत. उरलेल्या वेळात सूत कातुन स्वतःचे वस्र विणत असे. त्याच्या मते अन्न, वस्र निवारा याबाबतीत स्वावलंबी होऊन आरोग्य, शील, बुध्दी सतेज व्हावी.
विनायकाची नम्र वागणूकीने तो सर्वांचा आवडता तर झालाच शिवाय २१०० बटु त्याला नायक मानुन त्याच्या आज्ञा पाळत. एकदा सर्व बटुंना एकत्रीत करुन २१- २१ च्या गटाने ऊभे करुन प्रत्येकाला प्रत्येकाला हुद्दाही ठरवुन दिला. एकवीस गणांचा मुख्य तो गणपती, २१ गणपतीचा मुखय तो गणेश, २१ गणनायकांचा शास्ता तो गणनाथ, २१ गणनाथांचा नियंता तो गजानन आणि २१ गजाननांचा नेता तो महागणपती. अश्या प्रकारे गटागटांनी शिस्तबध्द गण-सैन्य तयार झाले.देशात या कल्पनेचा प्रसार झाला. विनायक महागणपती बनला.
विनायकाने कल्पकतेने "ऐरावत" नावाचे नाटक लिहुन त्याचा प्रयोग सादर केला. सर्वांना खुप आवडल्यामुळे त्याची खुप प्रशंसा केली. आठवण म्हणुन महागणपतीने आपल्या ध्वजावर गजराजाचे चिन्ह ठेवलं.
बटुंचे आश्रमातील विद्याभास पुर्ण झाल्यावर ते आपापल्या गावी गेलेत, पण विनायकाच्या सुचनेनुसार त्यांनी सुर्योपासक सैन्य वाढवण्याचा उपक्रम सुरु ठेवला. काशीराजास फार मोठा आधार मिळाला. महागणपतीची किर्ती सर्वत्र पसरली. कश्यप-अदितीस धन्यता वाटली.
वेदांचं शिक्षण संपल्यावर विनायक अमरावतीजवळ अश्विनीकुमारांच्या आयुर्वेद विद्यालयात सहा वर्षे आयुर्वेदाचा अभ्यास केला. तिथल्याही विद्यार्थ्यांना सूर्योपसकाची दिक्षा दिली.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख
श्रीगणेश*
भाग २
आयुर्वेदाच्या अभ्यासाने दुर्वा, शमी, आघाडा, मंदार, तुळस, बेल इत्यादी ह्या साध्या वनस्पतीने असाध्य रोगही बरे होतात हे समजल्यामुळे याचा उपयोग जनहितासाठी करण्याचा संकल्प केला. स्वतः तो २१ दुर्वांचा रस पिऊ लागला. आयुर्वेदाचे शिक्षण संपल्यावर आर्यवर्तात उत्तर धृवापासुन विषुवृत्तापर्यत फिरुन २१ गणराज्याची स्थितीचे अवलोकन केले. प्रत्येक राज्याचा ध्वज निराळा होता... व्याघ्र, सिंह! वराह, मूषक, व षभ, गज यावरुन त्या त्या गणराज्यास गजध्वज, मूषकध्वज अशी नांवे दिल्या गेली.
आर्यावर्ताच्या बाहेर असूर व राक्षस या जाती होत्या. त्या जाती सतत भारतखंडावर हल्ले करुन खुप त्रास देत असे आणि पराभवानंतर पळून जात. असुरांच्या राज्याची श्रृंभा नांवाची राणी होती. तिचा मुलगा नरांतक हा अतिशय क्रुर व आसुरी सत्तेचा अर्क होता. श्रृंभेचे स्वप्न होते की, हिमालयाच्या पलीकडील भारतावर आक्रमण करुन संपती लुटुन तेथी २१ राज्यं जिंकुन आपले राज्य वाढवावे. अार्यांना आसुरी सत्तेपुढे नमवुन सूर्योपासक धर्माचा निःपात करावा या महत्वाकांक्षेने तीने नरांतकाला तयार केले.
आर्यांच्या गणराज्यातील फुटीरतेचा फायदा घेऊन नरांतकाने काशी राज्याचे गणराज्य सोडुन संबंध आर्यवर्त जिंकुन सिंधपुरला राजधानीची स्थापना केली. नरांतकाच्या काळ्या रंगाच्या निशानावर ३२ दातांचा दंतध्वज फडकवुन मोठ्याने गर्जना करुन म्हणायचा, "जो कोणी माझ्या विरोधात राहिल त्याला या ३२ दातांखाली चावुन खाईन."
सगळीकडे एकछत्री अंमल स्थिरावल्यावर नरांतकाने मांडलीक राजांसाठी हुकुमनामा काढला, त्यात... सूर्यमंदिरातील सूर्याच्या मुर्ती काढुन टाकणे, श्रृंभादेवीची पुजा, तरुण रुपवान कन्या असुर तरुणांना देणे, सुवर्णालंकार न घालणे, सिंधपुरच्या खजीन्यात सर्वांनी सोने जमा करणे... या कडक अंमलबजावणीमुळे आर्यवर्ताला प्रेतकळा आली होती. सुवर्णमंदिरे भ्रष्ट झालीत, रुपसुंदर तरुणींनी आत्महत्या केल्यात. राक्षसांनी नुसता धुमाकुळ घालुन दंतध्वजाचे राक्षसी सैन्य प्रजेला प्रचंड दाताखाली भरडुन काढू लागले.
नरांतकाच्या नाशासाठी नरनारायणाचा कोणी तरी अवतार घ्यावा यासाठी जनता सूर्यदेवाला आवळू लागली, मनोभावे प्रार्थना करुं लागली. ज्वलंत उपासना व आर्त प्रार्थना सूर्यमंडलास जाऊन भिडली. त्या प्रार्थनेचे फळ म्हणुन महामुनी कश्यप आणि धर्मपरायण अदितीच्या पोटी विनायकाने जन्म घेतला. त्याचा प्रभाव अठरा वर्षापर्यत आर्यांना दिसला नाही. पण... नरांतकाचे अत्याचार महागणपतीला समजल्यावर तो खूप संतापला परंतु अजुन वेळ यायची होती. एकवीस कोटी गायत्रीमंत्राचा जप करुन अस्रविद्या हस्तगत होईतर्यत नरांतकांच्पा अत्याचाराचा कळस होऊ देत, जनता भरडल्या गेल्यामुळे चीड निर्माण झाल्यावरच ते संघटीत होऊन मदत करण्याची भावना निर्माण झाल्यावरच नरांतकाचा पराभव करणे सुलभ होईल.
त्रिशुलधारी सूर्यापासक गणांच सैन्य वाढत आहे ना, याकडे महागणपतीचे पुर्ण लक्ष होते. भूतानमधल्या गौरुशंकाराच्या 'पाशुपात" नांवाच्या अस्रविद्यालयात विद्यालयात विनायकाने २१०० बटुसहित अस्रविद्या अध्ययन व यज्ञयाग शिकण्यासाठी प्रवेश घेतला. महागणपतीने हटयोग, अस्रविद्या अवगत केली. त्याची धारणाशक्ती आणि गुरुभक्ती पाहुन शंकर प्रसन्न, संतुष्ट होऊन विनायकाला आपला पुत्र मानले.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
*सृष्टीनिर्मितीसाठी ब्रम्हदेवांस श्रीगणेशाचे आशीर्वाद*
ब्रह्मदेव महान तपस्वी व्यासांना म्हणाले, “हे वत्स! मंगलमूर्ती गजाननास प्रसन्न करण्याचे अनेक मंत्र आहेत. ज्या मंत्रांमुळे सिद्धी लवकर प्राप्त होते व ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सहा सद्गुणांची प्राप्ती होते. असा मंत्र मी तुला सांगतो. गणेश मंत्रात एकूण सात कोटी महामंत्र सांगितले आहेत. त्या मंत्रांचे दिव्य रहस्य गणेश पित्यास म्हणजेच देवाधिदेव महादेवास व मला माहित आहे. महामंत्रांपैकी षडाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. अनुष्ठान करणाऱ्याचे अंतकरण प्रथम सात्विक असावयास हवे. त्याचा आहार ही सात्विक हवा. अनुष्ठान करणाऱ्या गणेश भक्ताने प्रथम अभ्यंगस्नान करून शुचिर्भूत व्हावे, नंतर सोवळे नेसून दर्भासन किंवा त्यासारख्या शुद्ध आसनावर मनात कोणताही विकल्प न आणता बसावे. नंतर ॐ केशवाय नमः | ॐ नारायणाय नमः | ॐ माधवाय नमः | असा नामोच्चार करत आचमन करावे. त्यानंतर प्राणायाम करावा. श्रीगजाननाच्या पवित्र चरणकमलांपासून मस्तकापर्यंतच्या दिव्य स्वरूपाचे हृदयात ध्यान करून मानसपूजा करावी.” अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. महर्षी व्यासांना समाधान झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचे आभार मानले.
*एकाक्षरी मंत्र* : ॐ गं ॐ
*षडाक्षरी मंत्र* : ॐ वक्रतुण्डाय हुं ॐ
देवाधिदेव ब्रह्मदेवाकडून ही फलश्रुती ऐकून व्यासांना परमानंद झाला. ते ब्रह्मदेवास म्हणाले, “हे वात्सल्यमूर्ती ब्रह्माजी, आपण जे काही आत्ता सांगितले ते ऐकून माझे कान तृप्त झाले. या मंत्राचा महिमा विलक्षण आहे. किती ऐकले तरी मला समाधान होत नाही. त्यामुळे या दिव्य मंत्राच्या सहाय्याने कोणती सिद्धी प्राप्त झाली हे मला सांगा”, त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी व्यासांना खालील माहिती दिली.
सृष्टी निर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवावर पडल्यावर त्यांना ही सृष्टी कशी निर्माण करावी याबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यावेळी त्यांनी गणेशाची प्रार्थना केली की, “हे विघ्ननाशका, सृष्टी निर्मितीबाबत मी अज्ञानी आहे. मला याबाबतीत मार्गदर्शन करावे.” तेव्हा विनायक म्हणाले, “हे काम वाटते तेवढे अवघड नाही. माझ्या देहात सर्व ब्रह्मांड आहे, ते ब्रह्मांड एकदा तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व कल्पना येईल.” त्यानंतर श्रीगणेशाने ब्रह्मदेवास आपल्या श्वसन मार्गाने उदरात नेले. ब्रह्मदेवांना गणेशाच्या देहात अनेक ब्रम्हांडे दिसली. त्यामुळे ब्रह्मदेव भांबावून गेले. गजाननाने स्वतःच्या अफाट शक्तीने एक ब्रम्हांड फोडून दाखवले. या ब्रम्हांडात ब्रह्मदेवास सर्व सृष्टीचे दर्शन झाले. त्या उदरातील ब्रम्हांडात पृथ्वी, मनुष्य, ऋषी, राक्षस, देव, स्वर्ग इत्यादि सर्वांचे दर्शन. झाले अशा प्रकारच्या अनेक सृष्ट्या विनायकाच्या उदरामध्ये ब्रह्मदेवांना बघावयास मिळाल्या. ब्रम्हांडाची रचना पाहून ब्रह्मदेव गोंधळून गेले. त्यांनी गणेशाला उदरातून बाहेर काढण्याची विनंती केली. ते म्हणाले, “ब्रह्मांडाचा अंत पाहणे माझ्या हातून शक्य नाही. माझे आठ डोळे सुद्धा ब्रह्मांड पाहण्यास अपुरे आहेत. खरोखर तू अनादि अनंत आहेस.” ब्रह्मदेवाची हि द्विधा स्थिती पाहून श्री गणपतीने त्यास आपल्या उदरातून बाहेर काढले.
आपल्याला साक्षात लंबोदर श्रीगणेशाचे दर्शन झाले व स्वतः गणेशाने आपणास वेद, शास्त्रे, पुराणे यांचे गुढ ज्ञान दिले, अशामुळे ब्रह्मदेवास गर्व झाला. त्यांना वाटले की माझ्यासारखा भाग्यवंत त्रैलोक्यात कोणीही नाही. आता आपण कोणालाही वाटेल तो वर किंवा शाप देऊ शकतो. सृष्टीची निर्मिती करणे सुद्धा अत्यंत सोपे आहे. असे समजून त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीस सुरुवात केली. पण दुर्दैवाने अनेक विघ्ने समोर येऊन उभी राहिली. हजारो विघ्ने ब्रह्मदेवाभोवती गोल गोल फिरू लागली. ब्रह्मदेवासमोर सर्व विघ्ने विचित्र हातवारे करत नाचू लागली. त्या सर्वांनी ब्रह्मदेवास उचलले व वर फेकले. खाली पडल्यानंतर एकाने ब्रह्मदेवाच्या चारही शेंड्या धरल्या व ओढायला सुरुवात केली. दुसऱ्या विघ्नाने ब्रह्मदेवाची दाढी उपटण्यास सुरुवात केली. पाच सहा विघ्नांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवास टपला मारण्यास सुरुवात केली. अशा रीतीने ब्रह्मदेवास त्या विघ्नांनी छळून काढले. काही वेळानंतर ब्रह्मदेवास श्री गणेशाचे स्मरण झाले.
आता श्री गणेश आपणास सोडवेल असे त्यांना वाटले. ब्रह्मदेव म्हणाले, “हे गजानना, तू विघ्नहर्ता आहेस. असे असताना सुद्धा मी सृष्टी निर्मिती करत असताना विघ्ने कशी काय उत्पन्न झाली ? हे विघ्ने मला छळून काढत आहेत. तू यांचा बंदोबस्त कर.” अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे प्रार्थना केली. त्यानंतर ब्रह्मदेव शांतपणे बसले होते. तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक स्वप्न पडले. स्वप्नात ब्रह्मदेवास एक मोठा वटवृक्ष दिसला. त्यांना वटवृक्षाच्या एका पानावर एक गोंडस निरागस बालक दिसले. त्या बालकाला चार करकमल होते, सर्वांगाला रक्तचंदनाची उटी होती. त्या बालकाच्या मस्तकावर रत्नांनी जडलेला मुकुट होता. गळ्यात सुवर्णमाला होत्या. कानात सुवर्ण कुंडले होती, त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते पण डोके मात्र हत्तीचे होते. त्याचा एक दात तुटलेला होता. त्या बालकाचे रूप मनोहर होते. बालकरुपी गजाननाने खाली उडी मारली व ब्रह्मदेवांकडे आले व त्यांना म्हणाले, “हे विधाता, सृष्टी निर्मिती करताना मी श्रेष्ठतम आहे असा तुला गर्व झाला. कोणतीही गोष्ट गर्वाने करू नये. तुझे गर्वहरण करण्यासाठी नानाविध विघ्नांनी तुला छळून काढले. आता मी तुझ्या मनातले ओळखले आहे. मी तुला सर्वात दिव्य असा एक अक्षरी मंत्र सांगतो. तू या मंत्राचा दहा लक्ष जप कर. त्यानंतर मी तुला सामर्थ्यवान बनवेन.”
ब्रह्मदेवांना जाग आली. तेव्हा ताबडतोब त्यांनी एकअक्षरी मंत्रउच्चारण द्वारा तपश्चर्येला प्रारंभ केला. ब्रह्मदेवाची ही घोर तपश्चर्या पाहून लंबोदर श्रीगणेशास आनंद झाला. गणेश ब्रह्मदेवास प्रसन्न झाला. गणेशाने ब्रह्मदेवास दिव्य दर्शन दिले. ब्रह्मदेवाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी गणेशास साष्टांग नमन केले व म्हणाले, “हे ओंकारस्वरूपा! तू अनाथांचा नाथ आहेस. तुझे हे दिव्य दर्शन भाग्यवंतांनाच लाभते. आज सोनियाचा दिवस आहे. तू माझ्यावर प्रसन्न झालास, त्यामुळे मी तुझ्याकडे वर मागतो. माझ्या हृदयकमलात तुझे सदैव स्मरण राहू दे. तुमच्या कृपेने मला सर्व सृष्टीची निर्मिती करता यावी. मी ज्या वेळी आपणास मार्गदर्शनासाठी बोलवेन तेव्हा आपण जरूर यावे.” श्री गणेश म्हणाला, “माझा मधुर प्रसाद सेवन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच माझ्या स्मरणाने तूमची सर्व विघ्ने नाहीशी होतील. मी सदैव तुमच्या वर कृपा वर्षाव करेन. आता तुम्ही वेळ न घालवता विश्वनिर्मितीच्या कामाला लागा.”
श्री गजाननाने ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे त्याला सृष्टी रचना करण्याचे दिव्य सामर्थ्य दिले. पूजा झाल्यानंतर तेथे दोन लावण्यवती कन्या निर्माण झाल्या. या दोन देवि लावण्यवती कन्या म्हणजेच सिद्धी व बुद्धी होय. ब्रह्मदेवाने या विश्वातील प्रत्येकाचे कल्याण होवो असा वर मागितला. सिद्धी व बुद्धीस श्री गणेशाकडे सुपूर्त केले. श्री गणेशाने त्या दोन कन्यांचा स्वीकार केला.
ब्रह्मदेवाने सर्वप्रथम गजाननाचे पुन्हा एकदा स्मरण केले. आपले बाहू, मांड्या व चरणकमल यांपासून क्षत्रिय वगैरे तीन वर्णांची उत्पत्ती केली. नाभिककमला पासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, चरणकमला पासून पृथ्वी अशा पद्धतीने चातुर्य पूर्वक ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने अनेक वस्तू निर्माण केल्या. या वस्तूंची निर्मिती केल्यामुळे मनुष्याला फायदाच झाला. यामध्ये ब्रह्मदेवाने सागर, पर्वत, सरिता, वृक्ष, वेली, गवत इत्यादी अनेक वस्तू निर्माण केल्या.
[30/08, 12:20 am] +91 83290 19361: *श्री गणेश पुराण कथा (ब)*
*सिद्धीविनायकाची महिमा, मधु व कैटभ दैत्यांचा वध*
काही काळानंतर एक आश्चर्य घडले. सृष्टी निर्मिती करते वेळी लक्ष्मीपती श्रीविष्णू निद्रावस्थेत होते. त्यांच्या कर्णातून दोन अक्राळविक्राळ राक्षस आले. हे दोन राक्षस म्हणजे मधु व कैटभ होय. त्या राक्षसांनी सृष्टीचा निर्माण कर्ता ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक ऋषी मुनींच्या आश्रमांवर हल्ले केले. आश्रमांची नासधूस केली. त्या दोघांनी त्रैलोक्यात सर्वत्र हाहाकार माजवला. त्या दोघांनी नंतर स्वर्गावर आक्रमण केले. ते दोघेही महापापी होते. त्यामुळे ते वेद,शास्त्र, पुराने यांची निंदा करताना घाबरत नसत. त्या दोघांनी ब्रह्मदेवावर हल्ला केला. त्यांना गिळून टाकण्यासाठी कैटभाने आपले विशाल तोंड उघडले. ब्रह्माने प्रसंगावधान राखून निद्रादेवीची स्तुती केली.
या निद्रादेवीने विश्वाचा पालनकर्ता विष्णूस मोहित केले होते. त्यामुळे विष्णू निद्रावस्थेत गेले होते. ब्रह्मदेव म्हणाले, “हे देवी, तुझी लीला अगाध आहे. तू साक्षात विष्णूस मोहित केलेस. आता विष्णु जागे करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यांना तू जागे केले नाहीस तर सर्व अनर्थ होईल. त्यामुळे तू लवकरात लवकर विष्णूलोकी जा व केशवास जागे कर.” देवाधिदेव विष्णू जागे होईपर्यंत या राक्षसांनी अत्यंत गोंधळ केला होता.
त्यानंतर केशवाला जाग आली. त्या दोघांनी विष्णूस युद्धासाठी आव्हान दिले. विष्णूने ते आव्हान स्वीकारून घनघोर युद्ध केले. दोघांबरोबर विष्णूने मल्लयुद्ध सुरू केले. हे मल्लयुद्ध पाहण्यासाठी आकाशात देव-देवतांची गर्दी झाली. दोघे दैत्य व विष्णू आपली पूर्ण शक्ती पणास लावत होते. काही वेळा त्यांनी विष्णूंना खाली पाडले तर काही वेळा विष्णूने त्यांना गरगर फिरवून जमिनीवर आपटले. पण विष्णू राक्षसांचा पराभव करु शकले नाही. त्यामुळे विष्णु उदास झाले. त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी गायनामध्ये निपुण असलेल्या गंधर्वाचे रूप घेतले व हाती वीणा घेऊन दरबारी, कानडा, मालकंस, यमन, कल्याण इत्यादीसारख्या अनेक रागांचे गायन केले.
अशा प्रकारे त्यांचे स्वर्गीय आनंद देणारे गाणे ऐकून देव ,गंधर्व आनंदित झाले. शंभू महादेवांना सुद्धा हे दिव्य गायन ऐकून आनंद झाला. नारायणाने कैलासावर शंकराचे दिव्य दर्शन घेतले. भोलेनाथ व्याघ्र चर्मावर बसले होते. शेजारी त्रिशुल होते, तेथेच डमरू सुद्धा होता. गळ्यात साप होता. सर्वांगाला भस्म फासले होते. विष्णूने महादेवास नमन केले. विष्णू म्हणाले, “हे शिवशंभो, आज तुमचे दिव्य दर्शन झाल्यामुळे परमानंद झाला. सतत ॐ नमः शिवाय चा जप करणारे शिवभक्त तुमच्या चरणी लीन होतात. तुम्हाला कोटीकोटी प्रणाम.” विष्णूंचे गाणे ऐकून त्यांचे सुपुत्र श्रीगणेश, प्रियतमा पार्वती, नंदीला वगैरे आनंद झाला. विष्णू म्हणाले, “हे त्रिनेत्रधारी शिवशंभो, सर्व त्रैलोक्यात मधु व कैटभ यांनी गोंधळ माजवला आहे. या दुष्टांचा बंदोबस्त कसा करावा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर उभा आहे.” भोलेनाथ म्हणाले, “हे विष्णु, तुम्ही युद्ध करण्यापूर्वी माझ्या सुपुत्राचे म्हणजेच गणेशाचे स्मरण केले नाही. त्यामुळे तुम्हाला अपयश आले. आता दुसरे युद्ध करण्यापूर्वी गणेशाचे पूजन करूनच युद्धास सुरुवात करा.गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करा.”
भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे श्रीविष्णू तपश्चर्येसाठी गेले. श्रीविष्णूंनी सिद्धिक्षेत्र तपश्चर्येसाठी निवडले. त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्या पावन क्षेत्रात नारायणाने षडाक्षरी मंत्राचा शास्त्रशुद्ध जप केला. त्यानंतर लंबोदर श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले व म्हणाले, “हे लक्ष्मीपती, तुमच्या तपश्चर्येमुळे मी संतुष्ट झालो आहे. तुम्ही शंभर वर्ष तप केले, त्यामुळे तुम्ही धन्य आहात. तुम्हाला हवा तो वर मागून घ्या.” त्यावर विष्णू म्हणाले, “आपण शिवपार्वतीचे सुपुत्र आहात. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे. मला मधु व कैटभ या दोन दैत्यांना ठार मारायचे आहे. त्यासाठी मला शक्ती व युक्ती द्या. तसेच आणखी कोणी राक्षस उत्पन्न झाल्यास त्यांना ठार मारताय यावे म्हणून दिव्यास्त्र प्रदान करा.”
गणेशांनी त्यांची मनोकामना पूर्ण केली. जिथे विष्णूंना वर मिळाला त्याच ठिकाणी विष्णूंनी एक मोठे मंदिर बांधले. त्या मंदिरातल्या भिंतींवर श्रीगणपती अथर्वशीर्ष, गणपतीस्तोत्र कोरून घेतले. त्या ठिकाणी गंडकी शिळेची सुंदर मूर्तीची स्थापना केली. त्या ठिकाणी नारायणास सिद्धी प्राप्त झाली, म्हणून त्या मूर्तीस सिद्धिविनायक असे नाव दिले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन विष्णू मधु व कैटभ या दोन दैत्यांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाले. त्या तिघांमध्ये घनघोर युद्ध झाले.
बराच काळ युद्ध सुरू होते. श्री विष्णू दैत्यांना म्हणाले, “तुम्ही दोघेही शूरवीर आहात. आज पर्यंत मी तुमच्यासारखे योध्ये पाहिले नाहीत. मी तुमच्यावर प्रसन्न आहे, त्यामुळे तुम्ही मागाल तो वर देण्यास मी तयार आहे. ही सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही.” जगदीश्वराच्या या बोलण्यावर ते दैत्य मोठ्याने हसू लागले. ते विष्णूस म्हणाले, “अरे तुझ्या पेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. तुलाच एखादा वर हवा असेल तर मागुन घे. आम्ही वर देण्यास तयार आहोत.” विष्णूंनी क्षणभर विचार केला व म्हणाले, “आपला मान राखण्यासाठी मी एक वर मागतो तो मला आपण द्यावा. तुम्ही दोघांनी माझ्या हस्ते यमलोकी जावे, असा मला वर हवा आहे.” विष्णूंच्या चातुर्यपूर्वक उत्तरामुळे मधु व कैटभ दैत्य विष्णूला शरण गेले व म्हणाले, “आपली योग्यता श्रेष्ठतम आहे. त्यामुळे हे देवाधिदेव नारायणा, तूच आमचा वध कर. त्यामुळे आम्हाला मोक्ष मिळेल.” त्या नंतर त्या दोघांनी नारायणाला साष्टांग नमस्कार केला. त्या दोन्ही दैत्यांच्या इच्छेनुसार आपल्याजवळील सुदर्शनचक्राने विष्णूनी दोघांचा वध केला. मधु व कैटभ दैत्यांचा नाश केल्याने विष्णू मधुसूदन या नूतन नावाने ओळखले जाऊ लागले. विष्णुसहस्त्रनामावली मध्ये मधुसूदन या नावाचा उल्लेख आढळतो.
रीगणेश*
भाग - ३.
धनुर्विद्या आणि एकवीस कोटी गायत्रीमंत्राचा जप विनायकाने पुर्ण केला. शिक्षण आणि तपश्चर्या पुर्ण झाल्यावर आपल्या सहकार्यांसह शंकराचा निरोप घेऊ लागला तेव्हा शंकर-पार्वतीला गहिवरुन आले. वियोग सहन होत नव्हता, पण प्रजाहितासाठी नरांतकाचा नाश करणे अनिवार्य होते. भूतान राज्यातील लोक गणपतीला पार्वती-शंकराचा मुलगाच मानत. तीच प्रथा आर्यवर्तात रुजु झाली.... दंतकथा अशीही आहे की, एकदा पार्वती स्नानाकरितां गेली असतांना गणपतीला दारावर पहार्यासाठी उभे राहायला सांगुन कुणालाही आंत येण्यास मज्जाव करावा अशी आज्ञा दिली.
पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे विनायक दारावर पहार्याकरिता ऊभा असतांना शंकर तिथे येऊन आंत जाऊ लागले म्हणून गणपतीने त्यांना विरोध केला असतां संतापाच्या भरात शंकराने त्याचे शीर धडावेगळे केले. पार्वतीला कळल्यावर तिला शोक अनावर झाला. गणपतीला जिवंत करण्यासाठी ती शंकराला विणवू लागली. तेव्हा शंकराने हत्तीचे मस्तक आणुन त्याच्या धडावर ठेवल्याबरोबर तो जिवंत झाला.
चोवीस वर्षाचा तरुण विनायक श्रीशंकराचा आशिर्वाद घेऊन प्रत्येक राज्यातील गुरुकुलात जाऊन तिथल्या विद्वान पंडीतांशी वादविवाद करुन विजयपत्र घेऊ लागला. त्याच्या २१०० मित्रांनी राज्यातील गावोगावी जाऊन सुर्योपासनेचा प्रचार करुन शिस्तबध्द गणसैन्य तयार होऊ लागले.
नरांतकाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अनाथांच्या आर्त किंकाळ्या ऐकुन त्यांना धीर देत अश्रू पुसू लागला. गणसैन्याचं संचालन सुरु होऊन असुरी सैन्यांना प्रतिकार होऊ लागला. नरांतकाच्या हेरांचा प्रमुख धुम्राक्षाने बातमी दिली की, "कश्यपपुत्र विनायकाने २१ - २१ च्या गटाने त्रिशूल घेऊन गजध्वजाखाली जमतात. सुर्योपासना व गायत्रीमंत्र हा त्यांचा धर्म असुन देव, देश आणि धर्म यांच्या संरक्षणासाठी हे लोक आपल्या हुकुमाचा व सैन्याचा प्रतिकार करीत आहेत, शिवाय आर्य स्रीयांही या चळवळीत भाग घेत आहेत. आपण ज्या २१ हजार तरुणींना सिंधुपुरातील कारागृहात बंदिस्त केल्यात, त्यांच्या सुटकेसाठी रिध्दी-सिध्दी प्रयतनशील आहेत. महागणपतीच्या नेतृत्वाखाली मोठे स्रीसैन्य तयार होत आहे.
धुम्राक्षाने दिलेली माहिती ऐकुन क्रुर नरांतकाचा संताप अनावर होऊन त्याने जनतेवर, स्रीयांवर अत्याचाराचा कळस गाठला. एकदा कांबोज नगरीतील कांबोजिया नदीत रिध्दी सिध्दी गायत्रीमंत्रांचा जप करीत असतां विनायक त्यांना भेटला. सिंधपुरातील बंदिवासात असलेल्या एकविस हजार तरुणींंना सोडवण्यासाठी मार्गदर्शन मागीतले असतां, महागणपतीने २१-२१ च्या गटाने स्रीसैन्याची आखणी करुन आठ विभाग करायला सांगीतले. शक्ती, भक्ती आणि तेजाचे हे कार्य केल्यास भारतखंडाच्या ऊत्कर्षास साह्य होईल, कामाची वाटणी कशी करायची हे मार्गदर्शन करुन तो घरी आला असतां, व्यासांनी त्याला बद्रीकाश्रमी बोलावल्याचा निरोप मिळाला, त्याचवेळी रत्नापुरच्या काशीराजांकडून त्यांच्या मुलाच्या राजपुत्राच्या लग्नाचे पौरुहित्य करण्यासाठी निमंत्रण आले.
विनायकाची द्विधा मनःस्थिती झाली, प्रथम व्यासभेट घेण्यासाठी बद्रीकाश्रमाकडे निघाला. महागणपती ज्या रस्त्याने जाणार त्या जंगलांत नरांतकाचे सैन्य विनायकाला ठार करण्यासाठी दडुन, लपुन बसले. विनायक त्यांच्या कक्षेत आल्याबरोबर एक पिसाळलेला हत्ती त्याच्यावर सोडला. सावध विनायकानं हत्तीवर पाश फेकुन त्याची सोंड व पुढील पाय आवळुन त्याच्या गंडस्थळावर त्रिशुल खुपसुन ठार केले. एवढा मदोन्मत हत्ती कोसळलेला पाहुन राक्षससैन्य पळुन गेले.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
श्रीगणेश*
भाग- ४.
विनायक बद्रिकाश्रमात पोहोचल्यावर व्यासांना वंदन करुन बोलावल्याचे कारण विचारले असता ते सद्गतीत कंठाने म्हणाले, "विनायका, तू कवींचा कवी, बुध्दिवंताचा बुध्दिदाता आहेस. तुला मौजीबंधनाच्यावेळी पहिलं पर्व अर्पण केले होते. नंतर अठरा पर्वाचा अाराखडा पुर्ण केला, तरी तू महाभारत लिहावेस." त्याची आज्ञा शिरसावंद्य मानुन गणेशाने, सरस्वती तर त्याच्यावर लुब्ध होतीच, तीच्या प्रेरणेने महाभारत लिहिण्याचे कार्य व्यास कुटीत बसुन पुर्ण केले. व्यासांचा निरोप घेतांना व्यास आशिर्वाद देतांना त्याला म्हणाले, "हे सूर्योपसका! या थोर भारतात तुझ्या आज्ञा वेदाप्रमाणे मानल्या जाऊन सर्वत्र विजयी होशील."
बद्रीकाश्रमातुन निघतांना महागणपतीने २१०० महाभारताच्या प्रती संबंध आर्यवर्तात पाठविल्यात. घरोघरी महाभारताचं वाचन, पठन, मनन सुरु झालं. त्याचं नांव अबालवृध्दांच्या जीभेवर खेळु लागलं." श्री गणेशाय नमः।" असा मंत्र आबालवृधांच्या जीभेवर खेळु लागलं. प्रत्येक ठिकाणी गणेशाचं पुजन सुरु झालं. महागणपती आपल्या २१०० गणांसह सिंधूपुरास वळसा घालुन महापर्वत ज्वालामुखी ओलांडुन पाताळात रत्नापुरच्या काशीराजांच्या मुलाच्या लग्नास निघाला असतां वाटेत पुनः एक विघ्न आले.
वाटेतल्या भयंकर अरण्यात नरांतकाच्या सैन्याने गणपती व त्याच्या गणांवर जोरदार हल्ला चढविला. दोन्हीकडच्या सैन्यामधे भयंकर युध्द सुरु झाले. शेवटी दुर्वासांनी दिलेल्या शक्तीचा उपयोग करुन एक तेजस्वी बाण जो शंकरांनी दिला होता, सुवर्णभूषित, धुम्रयुक्त आणि भूजंगाप्रमाणे तिक्ष्ण बाण सूर्याला वंदन करुन पाशुपत धनुष्यास जोडुन नरांतकाच्या वक्षस्थळावर सोडल्याबरोबर नरांतक भूमीवर कोसळला. गणेशाने सिंधूपुरांत बंदिस्त असलेल्या एकवीस हजार कुमारिका बंधनमूक्त केल्यात. त्याच्या सन्मानार्थ अनेक वैभवसंपन्न राजांकडुन भोजनाचे निमंत्रणे आलीत, एका गरीब त्रृषीने तर गुळखोबर्याचे एकवीस मोदक करुन खाऊ घातले. विनायकाला खुप आवडले. तेव्हापासुन गणपतीला एकवीस मोदकांचा नैवद्य दाखवणे सुरु झाले.
भाद्रपद शुध्द चतुर्दशीला श्रीमहागणपती आपल्या अनुयायानासह रत्नपुरीहून उत्तरेस निघाला. जनतेने गणेशाच स्मारक म्हणुन हत्तीचा मुखवटा घातलेली भव्य मूर्ती तयार करुन भक्तीभावाने मंदिरात स्थापना केली. दहा दिवस उत्सव केला. नंतर विनायक हिमालयाकडे निघालाक प्रत्येक ठिकाणी जनतेने भव्य स्वागत सत्कार करुन उत्सव केलेत. गणेश पित्याच्या.. कश्यपांच्या आश्रमात येऊन माता पित्यांस वंदन केले.
विश्ववंद्य झालेल्या आपल्या पुत्राने तिन्ही लोकांत किर्तीचा झेंडा रोवलेला पाहुन माता अदितीस खुप धन्यता वाटली. अदिती विनायकास म्हणाली, तुझे ब्रम्हाश्चर्यव्रत संपला. ब्रम्हदेवाची मुलगी कुमारी सरस्वती-शारबा तुझ्यासाठी निवडली. तू महाभारताची रचना केलेली पाहुन ती तुझ्यावर अनुरक्त, लुब्ध झाली. तिच्याशी तू लग्न करावेस. नम्रतेने गणेश आईला म्हणाला, माते! क्षमा कर. मला संसारात पडायची इच्छा नाही. भारताची सेवा करण्यातच मला आयुष्य घालवायचे आहे.
अधर्मिय दुष्टांकडुन अत्याचार होतील त्यावेळी देव, देश, धर्म आणि आर्यस्रीधनाचं रक्षण व्हावं ह्या कार्याचे जनतेस स्मरण व्हावं, म्हणुन दरवर्षी दहा दिवस साजरे व्हावेत, या कार्याचा संपुर्ण विश्वात प्रसार करण्याचे ठरविले. आताही गणेश चतुर्थीपासुन अनंतचतुर्दशीपर्यत गणेशोत्सव आपण दरवर्षी
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
*श्री गणेश पुराण कथा (क)*
*भीमराजाची कथा*
महान तपस्वी व्यासांना ब्रह्मदेवांनी गणेश महात्म्य संबंधी आणखी एक रसाळ कथा सांगण्यास प्रारंभ केला.
भीम राजा विदर्भ देशातील कौण्डिन्य नगरात राहात होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती, सत्ता,ऐश्वर्य होते. भीम राजा मोठा पराक्रमी व दानशूर होता. प्रजादक्ष होता. अशा भीम राजास एक सात्विक, पतिव्रता प्रियतमा होती. तिचे नाव होते चारुहासिनी. तिला कशाचीही कमतरता नव्हती. पण मूलबाळ नसल्याने ती दुःखी असे. आपल्या अर्धांगिनीला झालेले दुःख राजास सहन होत नसे. एके दिवशी राजा आणि राणी एकांतात बसले होते. भीम राजा म्हणाला, “हे प्रिये, आपल्या विवाहास खूप वर्ष झाली. पण अजून सुद्धा पुत्रसंतती झाली नाही. त्यामुळे आपण राज्यत्याग करून, देवाची तपश्चर्या करण्यासाठी घनदाट अरण्यात जाऊ. त्यातच आपले हित आहे.”
त्यानंतर भीम राजांनी दोन विश्वासू प्रधानांना बोलवले. त्या दोन प्रधानांची नावे मनोरंजन व सुमंत अशी होती. त्यांना भीम राजा म्हणाला, “आम्ही दुःखी होऊन ह्या राज्याचा त्याग करुन वनात तपश्चर्या करण्यासाठी जात आहोत. तेथून आमचे पुन्हा येथे आगमन झाले नाही तर दोघांमध्ये अर्धे अर्धे राज्य वाटून घ्या व सुव्यवस्थित राज्यकारभार चालवा. प्रजेची काळजी घ्या.” नंतर भीम राजाने सपत्नीक अरण्याकडे प्रस्थान केले. ते दोघेही घनदाट अरण्यात आले. त्यांना तेथे एक निसर्गरम्य आश्रम दिसला. तो आश्रम महान तपस्वी विश्वामित्र ऋषींचा होता. तेथे विश्वमित्र दर्भासनावर शांतपणे बसले होते. ते दोघेही त्या आश्रमात गेले. आश्रमात आल्यानंतर भीम राजा व राणीने त्यांना वंदन केले. आपल्या दिव्य ज्ञानाने राजाचे आगमन येथे कशासाठी झाले आहे हे त्यांनी ओळखले.
विश्वमित्र ऋषी म्हणाले, “तुला सर्व सुखांची प्राप्त होईल, तुझ्या पोटी सद्गुणी, सात्विक, कीर्तीमान पुत्र जन्म घेईल. तू शिवपार्वती सुताचे म्हणजेच श्री गणेशाचे पूजन करण्यास सुरुवात कर. त्या गणेशास सर्व गोष्टीचे ज्ञान आहे. तुझे कुलदैवत मंगलमूर्ती श्री गणेश असताना सुद्धा संपत्तीच्या अहंकारामुळे तू त्याचे पूजन केले नाहीस. तेहतीसकोटी देवदेवतांमध्ये गणेशास अग्रपूजेचा मान मिळाला आहे. त्याचे स्मरण न केल्यामुळे सर्व देवदेवता तुझ्यावर असंतुष्ट आहेत. त्यामुळे तू निपुत्रिक आहेस. गजाननाच्या कृपेमुळे तुला नक्कीच संतान प्राप्ती होईल. तो आपल्या भक्तांची कामना पूर्ण करतो. आता तुला तुझ्या पूर्वजांचे चरित्र सांगतो, ते नीट ऐक.”
तुझ्या सातव्या पूर्वजांचे नाव होते भीम. तो सुद्धा पराक्रमी राजा होता. त्याच्या अर्धांगिनीचे नाव होते कमला. या दांपत्यास अनेक वर्षानंतर संतानप्राप्ती झाली. तो मुलगा जन्मताच मुका व बहिरा होता. त्याच्या पाठीला कुबड होते. सर्वांगाला क्षते पडली होती. सर्वांगाला दुर्गंधी येत होती. यामुळे महाराणीस रडू कोसळले. आता आपणच मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे राजास वाटले. राजाने काही विद्वान ज्योतिषांना या राजपुत्राचे नाव काय ठेवू असा प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, “राजन राजपुत्रास जन्मताच व्यंग आहे. त्याची जन्मभर दक्षता घ्यावी लागेल. त्यामुळे तू त्यांचे नाव दक्ष असे ठेव.” नामकरण समारंभानंतर आपल्या पुत्रासाठी राजाने अनेक मंत्र, तंत्र, देशी-विदेशी औषधे उपाय करून पाहिला. पण सर्व परिश्रम वाया गेले. त्यामुळे राजाने एक तप तपश्चर्या केली. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.
राजाच्या मनावरचा संयम गेला. तो चिडक्या स्वभावाचा झाला. एक दिवस रागाच्या भरात आपल्या प्रियतमेस म्हणाला, “तू व तुझा मुलगा येथून ताबडतोब जा. मला तुम्हा माय लेकाचे तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही.” असे बोलून राजाने त्या दोघांना घरातून हाकलून दिले. आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन कमला राणी गावोगावी फिरून भिक्षा मागून पोट भरत असे. ती भिक्षा मागण्यासाठी जाताना मुलाला मंदिरातच ठेवत असे. एकदा अशीच ती भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेली असता, तेथे एक महान भगवद् भक्त आला. तो ब्राह्मण होता. त्याच्या नजरेस ते मूल दिसले. त्याची दया येऊन ब्राह्मणाने ते उचलेले. ब्राह्मणाच्या शरीरावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने त्या व्यंग मुलाचे सर्वांग व्यवस्थित झाले. तो सामान्य मुला सारखा दिसू लागला. कुरूप मुलाचे गोंडस, मनमोहक मुलामध्ये रूपांतर झाले. त्याच्या अंगावरील सर्व क्षते नाहीशी झाली.
कमला राणी भिक्षा मागून परत आल्यानंतर तिला फार आनंद झाला. हे आपले मुल सुंदर कसे काय झाले ते तिला कळेना. तिने देवाचे आभार मानले. त्यानंतर काही वर्षानंतर देवास आपण प्रसन्न करून घ्यावे असे राजपुत्रास वाटले. दक्ष मनात म्हणाला, ‘तेहतीस कोटी देव देवता असून सुद्धा, श्री गणेशास अग्रपूजेचा मान आहे. तेव्हा मंगलमूर्तीलाच आपण प्रसन्न करून घेऊ या. तोच आपली मनोकामना पूर्ण करेल.’ दक्षाने श्रीगणेश उपासनेस प्रारंभ केला. प्रथम ॐ गं गणपतये नमः असा अष्टाक्षरी मंत्र जपण्यास सुरुवात केली. श्री गणेश त्याला प्रसन्न झाले. तेव्हा दक्षास गणपतीचे मनोहर रूप दिसले. एका क्षणातच गणपतीने ब्राह्मणाचे रूप घेतले व म्हणाले, “मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी या लहान वयात बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे.”
यावर राजपुत्र दक्ष म्हणाला, “हे शिवपार्वती सुता, गजानना, आता साक्षात तुझे दर्शन झाल्यामुळे मी आनंदी आहे. मी आता तुमच्याकडे वर मागतो.” त्यामुळे गजाननाने आपले पूर्वरूप धारण केले व म्हणाले, “बाळा, मी तुला वर देत नाही. कारण तो अधिकार माझा लाडका भक्त मुद्गल याचा आहे. त्याच्याच दिव्यस्पर्शामुळे तुझे शरीर सर्वांगसुंदर झाले. तू त्याच्या आश्रमात जाऊन भेट घे. तो नक्कीच तुला वर देईल.” असे सांगितल्यावर गणपती अंतर्धान पावले. हे पाहून दक्षाला रडू कोसळले. गजानन अंतर्धान पावल्यानंतर सर्वकाही त्याग करून दक्ष श्रीगणेशाच्या शोधासाठी बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याची माता पण होती. अशाप्रकारे भटकंती करत सुदैवाने राजकुमार दक्ष मुद्गल ऋषीच्या आश्रमात गेला.
भक्तिमय वातावरण पाहून दक्षास परमानंद झाला. आश्रमात व्याघ्र आसनावर मुद्गल ऋषी बसले होते. त्यांच्या समोर श्रीगणेशाची एक मनमोहक मूर्ती होती. ते भक्तीयुक्त अंतःकरणाने श्रीगणेशाची पूजा करत होते. दक्षाने त्यांना नमन केले. दक्ष म्हणाला, “मुनीवर, आपले उपकार मी कधीही विसरणार नाही. तुमच्या मुळेच माझे कुरूप शरीर सुंदर झाले. श्री गजाननाने मला दोन रूपाचे दर्शन घडविले. त्यांनी मला सांगितले की आपण मला वरदान द्याल , म्हणून मी येथे आलो आहे.” राजपुत्राचे हे बोलणे ऐकल्यानंतर मुद्गल ऋषी म्हणाले, “दक्ष, तु खरोखर भाग्यवान आहेस. साक्षात श्री गजाननाने तुला द्वी रूप दाखवले. म्हणजे भक्तीत तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मी गेल्या हजार वर्षापासून गणपतीच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत आहे, तरीसुद्धा तो माझ्यावर असंतुष्ट आहे.” असे बोलून मुद्गल ऋषिंनी दक्षास मिठी मारली.
त्यांनी राजपुत्रास एका दिव्य मंत्राचा उपदेश केला. तो दिव्य मंत्र म्हणजे एकाक्षर मंत्र होय. ऋषी म्हणाले, “तू नित्यनेमाने, भक्तिमय अंतकरणाने या एकाक्षर मंत्राचा निष्ठापूर्वक जप करत जा. यामुळे श्री विनायक तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.”
*श्रीगणेश*
भाग -५.
सर्व शास्रांमधे श्रीगणेशाला सर्व देवांपेक्षा महत्वाचं स्थान आहे. श्रीगजाननाची अाराधना म्हणजेच सर्व देवांची आराधना केल्याचं फळ मिळते, कारण ब्रम्हा, विष्णु, महेश तीन मुख्य देव! पैकी ब्रम्हा सृष्टीचे निर्माते, विष्णु पालनकर्ते तर महेश संहारकर्ते. विश्वाचा मित्र व सहाययक सूर्य, कर्म घडविणारी मोहरुपी आदीशक्ती मनाचं नियंत्रण करणारी... हे पांचही ब्रम्हरुप ईश्वर म्हणजे "गण" या गणाचा पती म्हणजेच नेता.. गणपती!
निर्माता, संहार व पालन करणारा, कर्म घडविणारा, मनावर नियंत्रंण ठेवणारा गजानन म्हणुन तो पुर्णब्रम्ह व सर्वश्रेष्ठ आहे.
शंकराचं कैलास, इंद्राचा स्वर्ग, काशी व इतर क्षेत्रांचा नाश होऊ शकतो परंतु श्रीमयुरेश्वरक्षेत्र अविनाशी आहे. हे क्षेत्र पृथ्वीवर असुनसुध्दा स्वर्गापेक्षा जास्त पवित्र व शक्तीशाली आहे. स्वतःची निर्मिती स्वतः करण्याची शक्ती असलेलं सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेवाहुन मयुरेशक्षेत्र श्रेष्ठ असल्याचं अनेक वेदांनी व शास्रांनी सिध्द केलं आहे.
विश्वविलासिनी महामाया, जी सत्तेची मालकीन या अविनाशी क्षेत्रापासुन दूर होताच तिच्या हातून सत्ता गेली. विश्व सृष्टी निर्माण करायहा सत्ता मिळावी म्हणुन तिनं ध्यान करुन तपश्चर्या केली. तिच्या त्या तद्रुप भूमिकेलाच भूस्वानंदक्षेत्र ही संज्ञा प्राप्त झाली, तेच हे भूस्वानंद म्हणजेच मयुरेश्वरक्षेत्र. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न् होऊन ऐश्वर्यसंपन्न होशील असा गणेशाने "वर" दिला.
महाशक्ती असणारी सुखकर्ता, दुःखहर्ता गणेशाने भक्तांना दर्शन देण्याकरितां, त्यांना कार्य करण्याची स्फुर्ती व कार्यात यश देणारी सिध्दी मिळावी, स्वमहिमारुप, स्वयंज्योतिर्गमय, साक्षात सयंवेदब्रम्ह, स्वस्वानंद, मायाधिष्ठानरुप, स्वानंदब्रम्ह जे मयुरेश्र्वर या पवित्र जागु भक्तांच्या रक्षणासाठी येऊन राहिले
भूत्वानंद क्षेत्ररुप ठरलेली भूलोकावरील सर्वात जास्त आनंद देणारी व सृष्टीवर नियंत्रण ठेवणारी जागा म्हणजेच मोरगावचे मयुरेश्वरक्षेत्र!
वेदामधे शक्ती, सूर्य, विष्णु व शिव या चार उपासना करणार्या देवतांचा निवास भूस्वानंद क्षेत्राच्या चारही दाराजवळ आहेत. श्रीमयुरेश्वर क्षेत्राच्या चार दिशांना जी चार दारं आहेत त्याच्या ह्या देवता आहेत. साक्षात आत्मस्वरुप परब्रम्ह, ब्रम्हणस्पती म्हणजेच गणेश हा त्यांचा नायक!
ऋग्वेदामधे " मंद्रेरिंद्रहरी भिः या मंत्रामधे ही माहिती असुन ती प्रमाणसिध्द आहे. साक्षात्स्वसंवेद्यस्वरुप, स्वानंद महिमा, साक्षात्किरण ब्रम्हरुप असा हा स्वानंदलोक, त्याचेच प्रतिबिंब म्हणजेच श्रीभूस्वानंक्षेत्र किंवा मयुरक्षेत्र होय.
काही काळाने भाविकांच्या पातकामुळे देवतांना मालिन्य येऊ लागल्याने, स्वतःचे निर्मल्यत्व अक्षय रहावं म्हणुन गणेशाची प्रार्थना करुन मोरेगांव येथील मयुरेशक्षेत्री राहण्याची परवाणगी देवतांनी मागीतली. मयुरेश्वरक्षेत्री वास्तव्य झाल्याने सर्व देवतांचे पावित्र्य कायम राहिले. विश्वामधे काशी प्रयागादी क्षेत्रे प्रसिध्द आहेतच, ती सर्व मूलस्वरुपाने व पुर्णसामर्थ्याने मयुरेशक्षेत्री आहेत.
पंचेश्वराची उत्पत्ती झाल्यानंतर सामर्थ्यप्राप्तीसाठी पांच देवांनी आत्मस्वरुपाचे ध्यान करुन तपश्चर्या केल्याने ते गजाननाशी एकरुप झाले. ब्राम्हणस्पती स्वरुप गणेशाचा साक्षात्कार त्यांच्या ह्रदयात प्रगट झाला.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
श्री गणेश पुराण कथा (ड)*
*बल्लाळ विनायकाची कथा*
सोमकांत राजाने आदरणीय भृगु ऋषींना प्रश्न विचारला, “ऋषी महाराज, स्वतः मुद्गल ऋषी एवढे तपस्वी असून सुद्धा त्यांच्यावर गजानन प्रसन्न का झाला नाही? दक्षाने ऋषीएवढी तपश्चर्या केली नव्हती तरी त्याला गजानन प्रसन्न कसा झाला? भृगु ऋषी म्हणाले, “मी तुला दक्ष राजपुत्राची पूर्वजन्माची सर्व हकीकत सांगतो.”
सिंधू नावाचा एक देश होता. त्या देशात एक गाव होते. त्या गावाचे नाव होते पल्ली. या गावात फार वर्षापूर्वी एक वाणी राहत होता. त्याचे मोठे किराणा मालाचे दुकान होते. या वाण्याचे नाव होते कल्याण. तो नावाप्रमाणेच दुसऱ्याचे कल्याण करीत असे. तो रोज लक्ष्मीची पूजा करत असे. त्याला सात्विक पत्नी लाभली होती, तिचे नाव होते इंदुमती. अशा या दांपत्यास देवाच्या कृपेमुळे सुपुत्र लाभला. त्यांनी त्याचे नाव ठेवले बल्लाळ. बल्लाळला लहानपणापासून खेळण्यात मुळीच रस नव्हता. त्याला देवपूजा करण्यास फार आवडत असे. एके दिवशी बल्लाळाच्या मनात वेगळाच बेत होता. त्याने एक गोटा घेतला व त्याला गणपती असे सर्वांच्या साक्षीने नाव दिले. त्याला फुलांचा हार घातला व दुर्वाची जुडी वाहिली. नंतर सर्व बालसेनेने मिळून श्रीगणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली.
बल्लाळाच्या काही मित्रांच्या जन्मदात्यांना हा प्रकार आवडला नाही. ते बल्लाळाच्या वडिलांना त्याबद्दल बोलले. गावातल्या लोकांचे हे बोलणे ऐकल्यावर कल्याण अत्यंत संतापला. वेताची काठी घेऊन तो गावाबाहेर गेला. कल्याणाने कसलाही विचार न करता काटक्यांचे देऊळ, मंडप वगैरे सर्व काही दूरवर फेकून दिले. बल्लाळ तिथे शांत चित्ताने नेत्रकमले बंद करून श्री गजाननाचे ध्यान करीत होता. कल्याणने त्याला पकडले व छडीने त्याला यथेच्छ बडवून काढले. त्यानंतर एका झाडाला उलटे लटकावून ठेवले.हा सर्व प्रकार झाल्यानंतर कल्याण घरी निघून गेला. त्याने इंदुमतीला सर्व हकिकत सांगितली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
इकडे बल्लाळने श्रीगणेशाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. “समुद्रमंथनाच्या वेळी हालाहल विष शंकराने प्राशन केले त्या नीलकंठाचा व पतिव्रता पार्वतीचा तुम्ही सुपुत्र आहात. तुम्हाला प्रथम कोटी कोटी प्रणाम. आता माझ्यावर जे संकट आले आहे, त्याचे तुम्हीच निवारण करा. मी तुमच्या दिव्य दर्शनासाठी आतुर झालो आहे.” आपल्या पिताश्रींनी श्रीगजाननाचे देऊळ मोडून टाकले, हे लक्षात आल्यानंतर बल्लाळ रागावला व त्याने साक्षात् जन्मदात्याला शाप दिला, ‘माझ्या जीवाचे जीवन असणारे श्री गजाननाचे मंदिर ज्याने फेकून दिले, तो दृष्टिहीन होईल, तसेच बहिरा, मुका व कुबडा होईल. त्याच्या शरीरास दुर्धर रोग होऊन सर्वांगास दुर्गंध सुटेल. हे देवा श्रीगणेशा मी जर तुझी भक्तीमय अंतकरणाने पूजा केली असेल तर हा शाप खरा होऊ द्या.’
बल्लाळाच्या भक्तीवर श्रीगजानन प्रसन्न झाले. त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात बल्लाळास दर्शन दिले. श्रीगणेशाने बल्लाळला बंधनातून मुक्त केले. बल्लाळाने श्रीगणेशाला साष्टांग नमस्कार घातला व गणपती स्तोत्राच्या पठणास प्रारंभ केला. श्री गणेशाच्या कृपादृष्टीने बल्लाळाच्या सर्व जखमा बऱ्या झाल्या. त्याचे शरीर पूर्ववत झाले. लंबोदराने त्याला जवळ बोलावले व म्हणाले, “एवढ्याशा वयात तुझी गणेश भक्ती पाहून मी धन्य झालो. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तू दिलेला शाप खरा होईल. पुढील जन्मात त्याला त्याचे वडील घराबाहेर हाकलून देतील.”
बल्लाळ म्हणाला, “तुमचे दिव्य रूप माझ्या हृदयात राहू द्या व मुखामध्ये सदैव तुमचे नामस्मरण असू द्या. तुम्ही आता इथेच राहून लोकांवर प्रेमाचा वर्षाव करा. त्यांच्या प्रापंचिक अडचणी दूर करा.” गणपती म्हणाले, “जशी तुझी इच्छा! तू मला इथे राहण्यासाठी सस्नेह आमंत्रण दिले, त्यामुळे माझ्या आधी लोक तुझे नाव घेतील. मी बल्लाळविनायक या नामरूपाने प्रसिद्ध होईल. अनेक गणेशभक्त माझ्या दर्शनासाठी येतील.”
बल्लाळाने दिलेला शाप खरा झाला. त्या कल्याण वाण्याचे सर्व अंग बधीर झाले. त्याची वाचा गेली. तो दृष्टिहीन झाला. त्याला काही ऐकू येईना. त्याच्या शरीरात दुर्धर रोग झाला. इंदुमती ने मात्र त्यांची साथ सोडली नाही. इंदुमती आपल्या मैत्रिणींसह बल्लाळाला आणण्यासाठी गावाबाहेर आणण्यात गेली. तेथे गेली तर तिला वेगळेच दिसले. तिथे एक श्री गजाननाचे सुंदर मंदिर होते. बल्लाळ श्रीगणेशाची पूजा करत बसला होता. तिने धावत जाऊन आपल्या सोनुल्यास मिठी मारली व म्हणाली, “आता तू घरी चल. तुझे वडील फार आजारी आहेत. तू दिलेल्या शापामुळे हे सर्व झाले आहे. त्यामुळे तूच आता पिताश्री साठी काहीतरी उपाय शोधून काढ.” बल्लाळ म्हणाला, “पिताश्रींच्या हातून महापाप झाले. त्यामुळेच मी त्यांना शाप दिला. मला आता सर्व गोष्टींचे ज्ञान झाले आहे. त्यामुळे मी घरी येणार नाही. माझे जीवन श्रीगजाननाच्या चरणी अर्पण करणार आहे. त्यामुळे तू आता घरी जाऊन पती परमेश्वराची सेवा कर. तू सुद्धा गजाननाची भक्ती कर.”
इंदुमती म्हणाली, “याच्यासाठीच आम्ही तुला जन्म दिला का? तू शाप देताना थोडा तरी विचार करायला हवा होतास. आपल्या पिताश्रींना शाप दिल्यामुळे तुझे पुण्य नक्कीच क्षीण झाले आहे. वृद्धापकाळी आधार असावा म्हणून आई-वडील मुलांना जन्म देतात. पिताश्रीमुळे तुला हे निसर्गरम्य जग पाहायला मिळाले. तेव्हा त्यांच्या उपकारांची परतफेड कर. बल्लाळ म्हणाला, “मला क्षमा कर माते. मी चुकलो. मी तेथे येऊन सुद्धा उपयोग नाही. पुढील जन्मी त्यांचे कल्याण होईल. त्यांना राजकुळात जन्म मिळेल. त्यावेळी तुझे नाव कमला असेल. तुम्हाला भविष्यकाळात श्री गजाननाचे दर्शन नक्की होईल. त्याची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील.” ती भविष्यवाणी ऐकून इंदूमती घरी आली. बल्लाळाला आणण्यासाठी श्रीगणेशाने खास दिव्य विमान पाठवले. त्या विमानात बसून बल्लाळाने स्वर्गलोकी प्रस्थान केले.
*गणेश देवता व गणेशोत्सव स्वरूप*
हिंदू धर्मात गणपतीला (गणेश) फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पूत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.
ज्या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले त्या दिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटले जाते. त्यानंतर ११ दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला गणपतीच्या विसर्जनानंतर संपतो.
महाराष्ट्र, गुजरात आंध्रप्रदेशात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात ) गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची लहान मूर्ती आणली जाते व १० दिवस मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली जाते. सध्या तर परदेशस्थ भारतीय ही हा उत्सव मोठ्या दिमाखात तेथे साजरा करतात .
या काळात रोज सकाळी व संध्याकाळी त्याच्यापुढे आरती म्हटली जाते. मोदकाचा प्रसाद दिला जातो. ११ दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते.
१८९२ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली. पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जागृती निर्माण व्हवी हा हेतु त्यामागे होता. सरदार खाजगीवाले यांनी सर्वात प्रथम गणेशोत्सव ग्वाल्हेरला साजरा केला. गणपत घोवडेकर, भाऊ वैद्य, भाऊ रंगारी यांनी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ष्ठापना करुन हा उत्सव साजरा केला.
हे पाहून टिळक यांनी पुण्यात केसरीवाड्यात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर काही लोक दीड दिवसांनी, काही पाच, सात किंवा अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात.
गणपती बसल्यानंतर पाच दिवसांनी गौरींचे आगमन होते. त्या तीन दिवस राहतात. पहिल्या दिवशी आगमन दुसरे दिवशी भोजन व तिसरे दिवशी विसर्जन करतात साधारण पणे सातव्या दिवशी त्यांचेही विसर्जन केले जाते. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात.
यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक देखावे असतात. अनंत चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढून गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते.
पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवात मेळे ,नाटके संगीताचे कार्यक्रम जादूचे प्रयोग व्याख्याने कथाकथन व तत्सम करमणुकीचे कार्यक्रम होत असत सध्या यात बरेच बदल झाले असून स्पर्धा अर्केस्ट्रा डान्स लेझर शो असे विविध कार्यक्रम असतात एकंदरीत हा आनंदोत्सव असतो सर्वत्र पवित्र पण आनंदी व धार्मिक पवित्र वातावरण असते . हा एक धार्मिक , सांस्कृतिक व सामाजिक आनंदोत्सव च असतो सर्वत्र विद्युत रोषणाई व लोकसंगीत याची मेजवानीच असते हा उत्सव अबाल वृद्ध स्त्री पुरुष गरीब श्रीमंत सर्व दुःख विसरून यात सहभागी होतात। व आनंदी होतात .
गणेश नवसपूर्ती देवता ..
विवाह जुळून येण्यासाठी उपासना व उपाय ..
सध्या तरुण तरुणींचे विवाह होत नाहीत अनेक समस्या येत आहेत त्या हेतू गणरायाचे कृपेने हा सामाजिक प्रश्न समजून उपाय सांगत आहोत .सदर उपाय श्रद्धेने केल्यास निश्चित यश येऊ शकते असा भक्तांचा अनुभव आहे ..
श्री गणेश अथवा गणपतीला मंगलमूर्ती असेही नाव आहे आणि ते नाव यथार्थ आहे. कारण तो गणेश म्हणजे मंगल करणारा – साक्षात मंगलतेची मूर्ती आहे. कोणत्याही कार्यातली विघ्ने दूर करून ते कार्य पूर्ण करून देणार आहे. तेव्हा तो लग्नात विवाहात येणारी विघ्ने दूर करील, विवाह…ठरण्यात, जमण्यात, होण्यात, येणारे अडथळे निवारण करील यात काय शंका ? त्याची सेवा कोणत्याही प्रकारे केली, तरी विवाहात येणारे अडथळे दूर होतील व विवाह ठरून पारही पडेल, हे निश्चित तरी त्यापैकी आपण गणपतीचे काही मंत्र व तोडगे आता पाहू.
संकष्टी चतुर्थी करावी — या तोडग्याला कोणत्याही संकष्टी चतुर्थी पासून सुरुवात करावी. मात्र दिवसभर मीठ खाऊ नये. अळणी उपवास करून रात्री उपवास सोडताना देखील त्यात (भोजनात) मीठ नसावे. उपवास सोडण्याआधी एकवीस वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष वा श्री गणेश स्तोत्र म्हणावे. नंतर गणेशाची पूजा करून विवाहाबद्दल प्रार्थनाही करावी. हा उपाय करताना सोबत गणेश कवच धारण करून, विघ्नहर्ता धुपकाडी याचा वापर करावा. तसेच भ्रूमध्यावर मोहन तीलक लावावे.
रोज सकाळी बारा वाजण्याच्या आत गणपतीच्या कोणत्याही देवळात जावे. गणेशाचे दर्शन घेउन त्याला, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. पहिल्या दिवशी त्याला अभिषेक करावा. पूजा करावी, हा तोडगा विवाह होईपर्यंत दररोज अखंडपणे करावा. मंदिरात जाणे अभिषेक करणे शक्य नसल्यास स्फटिक गणेश, पारद गणेश मूर्ती घेऊन त्यावर अभिषेक करावा. ( जमल्यास प्रभावी कवच परिधान करावे.)
कोणत्याही गणेश मंदिरात अथवा आपल्या घरात स्फटीक अथवा पारद मूर्तीवर २१ दिवस रोज एकवीस वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. पहिल्या दिवशी संकल्प करून अभिषेक व पूजा करावी प्रार्थना रोज करावी.
बुधवारचे व्रत करावे. प्रथम संकल्प सोडून कोणत्याही बुधवारी हे व्रत सुरु करावे. एक चांदीचे छोटेसे ताट-ताटली घ्यावी. (ताम्हण घेऊ नये). त्यात कुंकवाने कींवा लाल चंदनाच्या गंधाने स्वस्तिक काढावे. त्या स्वस्तिकावर गणपतीची स्फटीक अथवा पारद मूर्ती ठेवावी. या मूर्तीची पूजा षोडषोपचारे करावी. त्यावेळी १०८ दुर्वा गणपतीला एका वेळी एक दुर्वा याप्रमाणे वाहाव्या. प्रत्येक दूर्वा वहातांना गणपतीचा “ओम गं गणपतये नमः” हा मंत्र अथवा “गणेश अष्टोत्तर शतनामावली” म्हणून दूर्वा वाहाव्यात. नंतर आरती करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. बुधवारी दिवसभर उपवास करावा. मीठ दिवसभर खाऊ नये. फळे, दूध व थंडपेय घेतली तरी चालतात. याप्रमाणे व्रताचरण विवाह ठरेपर्यंत चालू ठेवावे.
गणेश नवग्रह पूजन – एक चौरंग घ्यावा. पूजेच्या जागी साफसफाई करून रांगोळी वगैरे काढून ती जागा सुशोभित करून, तेथे चौरंग ठेवावा. त्या चौरंगावर लाल कपडा घालावा. हे कापड शक्यतो नवे असावे, नवे शक्य नसेल तर स्वच्छ धुऊन नीट वाळवलेले असावे. त्यावर गणपतीची एखादी मूर्ती ठेवावी. या गणेशाच्या मूर्तीच्या पुढील बाजूस नवग्रह म्हणून 9 सुपार्या ठेवाव्यात. तसेच एक कलश ठेवावा, त्यात पाणी भरून ठेवावे. आणि त्याच्या तोंडाशी आंब्याची पाच किंवा सात पाने व एक नारळ उभा ठेवावा. यानंतर कलश नवग्रह आणि गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करून षोडशोपचार पूजा करावी. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मग संकल्प करावा, (येथे स्वतःच्या नावाचा उच्चार करा.) नाम्न शीघ्र विवाह सिद्ध्यर्थे गणपती देवता प्रीत्यर्थे मंत्रजपम करीष्ये | संकल्प करताना पळीभर पाणी, थोडे तांदूळ / अक्षता , हळकुंड , सुपारी व तांब्याचे किंवा कोणतेही एक नाणे हे सर्व तळहातावर घेऊन वरील प्रमाणे संकल्प करताना पळीभर पाणी, थोडे तांदूळ अक्षता हळकुंड सुपारी व तांब्याचे किंवा कोणतेही एक नाणे हे सर्व तळहातावर घेऊन वरील प्रमाणे संकल्प विचारल्यानंतर पाण्यासह त्या सर्व वस्तू ताम्हणात घेऊन घ्याव्यात. नंतर तीन वेळा आचमन करावे. मग गणेशाच्या खालील मंत्राचा जप करावा.
ओम श्री गणेशम् वीघ्नेश वीवाहार्थे ते नम: l किंवा सालंकृत कन्या मे देही नमस्तयै गणेशाय नमः l या मंत्राचा जप रोज १०८ एवढा विवाह ठरेपर्यंत करावा.
गणेश पुराण या ग्रंथातील अध्याय १०९ ते १२५ अखेर नित्य वाचावे. हे अगदी अशक्य असेल, तर १०९ वा अध्याय आणि १२५ वा अध्याय तरी वाचावा . हेही शक्य नसेल तर १२५ वा अध्याय रोज वाचावा.
मुद्गगल पुराण या ग्रंथातील सहाव्या खंडातील ४० आणि एकेचाळीसावा अध्याय वाचावा.
प्रेमविवाह होण्यामध्ये काही अडथळे येत असतील किंवा अन्य कोणत्याही कारणाने विवाह जुळत नसेल, तर टिटवाळा येथील गणेशाचे दर्शन घेण्यास जावे. तेथे त्याची जमेल तशी सेवा करावी. शिवाय विवाह होऊन पुढे काही कारणाने संबंध दुरावल्यास ह्या गणेशाची सेवा करावी. मंगळ पीडा असलेल्यांचे विवाह याच्या दर्शनाने वा सेवेने होतात. या गणपतीचे नावच वर विनायक किंवा विवाह विनायक आहे. (टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा – ठाणे येथे आहे.)
अष्टविनायक यात्रा करावी, आणि प्रत्येक ठिकाणी विधिवत पूजा, अभिषेक वगैरे करून मनापासून विवाह साठी प्रार्थना करावी. नंतर विवाह होईतो रोज एकदा तरी अष्टविनायकाचे स्मरण करून प्रार्थना करावी. त्याचे दर्शन घ्यावे. (अष्टविनायकाच्या फोटोचे चित्राचे).
कोणत्याही गुरुवारी पुनर्वसु नक्षत्रावर रात्री बारा वाजता आंघोळ करून श्री गजानन महाराजांची पूजा करून संकल्प करून श्री गजानन विजय पोथी चा एक अध्याय वाचावा. त्यानंतर रोज एक अध्याय वाचावा. जोपर्यंत विवाह ठरून पूर्ण होत नाही, तोपर्यंत पारायणे करीत रहावे. विवाह झाल्यानंतर शेगावी जाऊन झुणका भाकर व हिरव्या मिरच्यांचा नैवेद्य महाराजांना दाखवावा. महापूजा करुन संकल्प पूर्ण करावा.
विवाह त्वरित होण्यासाठी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील २८ व्या अध्यायाचे पारायण लग्न होईपर्यंत अखंडित चालू ठेवावे. कोणत्याही रविवारी, मंगळवार, गुरुवार या वारी शुभ नक्षत्र असताना शुभ मुहूर्तावर हे पारायण सुरु करावे हे पारायण सुरु करावे. हे पारायण करताना प्रथम गणपती, शंकराचे, व दत्ताचे पूजन करावे.
गोरक्ष जालंदर चर्पटाश्च l अडबंगकानिफ मच्छिंन्दराद्या : l चाैरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा l भूम्यां बभूर्वनवनाथ सिध्दा: ll
वरील श्लोक २१ वेळा म्हणून माझा विवाह त्वरित होण्यासाठी मी हा पाठ वाचण्यास सुरुवात करीत आहे. त्यात मला यश मीळू दे. अशी अंत:करणापासून प्रार्थना करून नवनाथांना नमस्कार करावा. गुलाबाचे अथवा चाफ्याचे फूल दत्ताच्या फोटो पुढे ठेवावे व अध्याय वाचण्यास सुरुवात करावी. विवाह पूर्ण झाल्यानंतर नऊ जणांना जेवू घालावे. त्यांना यथोचित दक्षिणा द्यावी व त्यांना नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
हे सर्व उपाय संग्रहित आहेत केवळ गजाननाचे कृपेने अनेकांनी अनुभवलेले आहेत मी फक्त पुनर्मुद्रित करून आपले समोर ठेवलेत . श्रद्धेने हे करा व गजाननाचे कृपेने विवाह बद्ध व्हा .गणपती ही १४ विद्या व ६४ कला यांचा अधिपती असून गणांचा अधिपती आहे आपले कार्य निर्विघ्नपणे पार पडेल यात शंकाच नाही .
श्री सिद्धिविनायक चरणी समर्पित ...
*श्रीगणेश*
भाग--६.
पंचदेवांना ध्यानस्थितीत गणेशाचे जे दर्शन झाले ते प्रत्यक्षात घडावं अशी प्रार्थना केली, तेव्हा आकाशवाणी झाली की, गुरुच्या सानिध्यात गेल्याशिवाय योग्य ज्ञान व दर्शन होऊ शकत नाही. तरी भक्तश्रेष्ठ श्रीभ्रुशुंडीयोगांद्राच्या अमलाश्रमात जाऊन त्याला शरण जा.
पंचदेव अमलाश्रमांत श्रीभ्रुशुंडीचे दर्शन घेतल्यावर त्यांना समग्र गणेशज्ञान देऊन म्हणाले, "पंचदेव हो! जीथे आत्मस्वरुपाचं ध्यान केले त्यावेळी देवबलाने साक्षात्कार होऊन श्रीगणेशाचं दर्शन झाल तिथे परत जाऊन ध्यानात दिसलेल्या मूर्तीची स्धापना केल्यास गजाननाचं दर्शन होऊन कृतार्थ व्हाल."
वेदांनी सांगीतलेल्या भूस्वानंद अर्थात मयुरेशक्षेत्री मोरगांवला मुख्याधिष्ठान स्थळी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पंचेश्वरांनी गजाननाची मुर्तीप्रतिष्ठा केली. पांच महिण्याने माघ शुक्ल चतुर्थीला मयुरावर विराजमान असलेल्या गणेशाने प्रसन्न होऊन पंचश्वरांना सृष्टी व सत्ता दिली, माया म्हणजे मयुरा, तिच्यावर नियंत्रण ठेवणारा तो मयूरेश! पुढे या जागेला मोरगाव आणि मोरगांवचे क्षेत्राधिपती श्रीगजानन यांना मयूरेश नांव पडले.
मयूरेशक्षेत्राचे महात्म्य अमोघ, परिणामी, अतुल व फलदायी आहे. या विषयी एक कथा प्रसिध्द आहे. सुप्रतिक नांवाचा एक तरुण तिर्थयात्रेच्या निमित्ताने यात्रेकरुमधे मिसळुन त्यांना लुबाडणे, त्यांचा घात, खुण, दरोडे ही सर्व पापे तो करीत असे. एकदा चोरी करण्याच्या उद्देशाने यात्रेकरु मंडळीबरोबर पुराण कथा ऐकायला बसला असतां त्यावेळी स्कंद पुराणातील मयुरेशक्षेत्राचे महात्म्य सांगीतल्या जात होते. मयुरेशक्षेत्राच्या वर्णनात एवढी शक्ती आहे की, सुप्रतिकाच्या अंतःकरणात एकाएकी बदल झाला. त्याचा एकदम कायापलट झाला. पुराणिकांनी त्याला या क्षेत्राचं महात्म्य ऐकवल. आणि काय आश्चर्य! ज्याच्या ठीकाणी थोडीसुध्दा पुण्यबुध्दी उत्पन्न होण्याचा संभव नव्हता, त्या सुप्रतिकाने पश्चातापदग्ध होऊन मयुरेशक्षेत्री कायमचा आश्रय घेतला.
श्रीभ्रूशुंडीमहाराज व पंचदेव यांचा संवाद सुरु असतांना पंचदेवांनी विचारले, "इतर क्षेत्र विनाशी तर मग मोरेश्वरक्षेत्रच अविनाशी कसे?" गणेश जो स्वानंद, पुर्णब्रम्ह्य स्वरुप, त्याने स्वतःकरितां निर्माण केलेले असल्यामुळे हे मयुरेशक्षेत्र अविनाशी आहे. इथुनच इतर क्षेत्र व ब्रम्हाडांची निर्मिती झाली. याचा विनाश झाला तर सृष्टी पुनः निर्माण होणारच नाही. याच क्षेत्री योगिंद्रमहाराजांनी गणेशविजय नांवाचा ग्रंथ लिहिला.
गणेशाच्या निःश्वासापासुन उत्पन्न झालेले आदिगुरुस्वरुप असे वेद, गणेशाच्या आज्ञेवरुन पांच देवांना देण्यास सांगीतले असतां त्यांना दिव्यदृष्टी देऊन ब्रम्हसत्ता ज्योतीस्वरुप असे श्रीमयुरेश क्षेत्र दाखविले.
श्रीमयुरेश क्षेत्राचं साक्षात ब्रम्हस्वरुप वेदात व गणेशविजय ग्रथांत सुध्दा सांगीतले आहे. हे क्षेत्र सार्वभौमस्वरुपाचे, स्वयंभू व समर्थ क्षेत्र आहे. सर्व क्षेत्रांचे, सत्तेचे, क्षेत्रप्रकाशाचे मुळ हेच असुन ब्रम्हा विष्णु, शिव शक्ती सुर्यादी पंचेश्वरांनीही श्रेष्ठ मानले. श्रीमौदगल पुराणाच्या सहाव्या खंडात श्रीगणेशाने प्रसन्न होऊन समग्र क्षेत्रदेवतांना वरदान दिल्याचा उल्लेख आहे.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*प्राचीन मूर्तिशास्त्र व विविध गणेशरूपे.*
*मूर्तिशास्त्रानुसार गणेशरूप मोठे आव्हानात्मक व मोहविणारे असे आहे... साधारणतः गणेश पुराण व स्कंद पुराणातील वर्णनाप्रमाणे त्याचे रूप (मूर्ती) व चित्र असते. अर्थात, गुप्तेतर काळात गणेश प्रतिमांची संख्या व प्रकार वाढले. पाषाण, माती (मृत्तिका) याचबरोबर रुईचे (मंदार) खोड, चंदनाची मूर्ती, पोवळे, यासह मध्ययुगात हस्तिदंती, काष्ठशिल्प, आदींसह आधुनिक युगात पारदर्शक काचेच्या मूर्ती, फायबर, प्लास्टिक, तांदळावर कोरलेला आदी अनेक प्रकारात गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. यासाठी आपण सर्व गणेशभक्तांनी चित्रकार, मूर्तिकार, कलेच्या व मूर्तिकलेच्या विद्यार्थ्यांनी पुण्याच्या सारसबागेतील गणेश मंदिरामागील 'गणेश दर्शन संग्रहालयाला' जरूर भेट द्यावी. तेथे श्रीगणेशाची शेकडो रूपे आपणास पाहावयास मिळतील.....*
*स्कंद पुराणात (काशी खंड) वानर, सिंह व हत्ती अशा त्रिमुख व पंचमुख विनायकाचा उल्लेख आहे... याच पुराणातील माहेश्वर खंडात गणेशमूर्तीचे राजस, सात्त्विक, तामस असे वर्गीकरण येते. पाच तोंडे, दहा हात असलेला गणपती सात्त्विक व चार हातांचा, सोनेरी रंग असलेला राजस आणि निळ्या रंगाचा तामस वृत्तीचा गणेश आहे......*
*याचप्रमाणे गणेश पुराणात बाल गणपतीचे वर्णन आहे... चार युगांचे चार गणपती यात दिले आहेत ते पुढीलप्रमाणे :*
*१) कृतयुगातील गणेश 'विनायक' आहे. तो दशभुजा व सिंहारूढ असतो.....*
*२) त्रेतायुगातील गणेश 'मयुरेश्वर' असून, तो सहा भुजांचा मयूरारूढ (मोर) आहे.....*
*३) द्वापार युगातील गजानन चतुर्भुज असून, मूषक (उंदीर) हे त्याचे वाहन आहे.....*
*४) कलियुगातील धूम्रकेतू नामक गणेश मात्र द्विभुज असून, अश्व (घोडा) हे त्याचे वाहन आहे.....*
*मध्ययुगाच्या प्रारंभीच्या काळातील ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वरांनी सुरवातीलाच गणपतीची वंदना केली आहे... पल्लव, चोल काळातील अनेक गणेशशिल्पे मिळतात.....*
*सातव्या, आठव्या शतकातील थोडक्यात गणेशाचे प्रकार:*
*१. नृत्य गणेश- ब्रह्मपुराणात याचे वर्णन असून, आपल्या नृत्याने गणेशाने शिव-पार्वतीला प्रसन्न करून डोक्यावरील चंद्र व इतर आभूषणे व सर्व गणांचे आधिपत्य मिळविले होते. त्रिभंग (गुडघा, कंबर, खांदा- मानेत वाकलेली) अवस्था तोल, लय हे याचे वैशिष्ट्य. पायात घुंगरू व हाती वाद्येही असतात.....*
*२. शक्ती गणेश- थोड्याच (क्वचितच) या मूर्ती (मथुरेत) आहेत. आपल्या शक्तीला (देव) आलिंगन मुद्रेत मांडीवर घेऊन बसलेला या मूर्तीत दिसतो. झाशी (उत्तर प्रदेश) राणी महालात या मूर्ती आहेत. शक्ती (देवीचा) पाय सिंहाच्या पाठीवर ठेवलेला आहे. पुन्हा येथे सिंह हे शक्ती, राजसत्ता याचे प्रतीक आहे.....*
*३. पंचविनायक (गणेश)- स्कंदपुराणातील गजविनायकाचे हे रूप आहे. ओळीने पाच गणपती (शिलापट्टीवर) आहेत. त्यातील एक हत्तीरूपातील (गज) आहे.....*
*४. महागणपती, पंचमुख गणेश- नेपाळी कलेत ही मूर्ती मिळते. पाच सोंडी आणि दहा हात, हे महागणपतीचे लक्षण. चार बाजूंची गजमुखे व त्यावर अजून एक मुख, हे ढोबळ रूप. काशीतील धुंडिराज गल्लीतील बंगालच्या राणी भवानी मंदिरात ही प्रतिमा आहे. ही मूर्ती बरीच आधुनिक आहे.....*
*५. यक्षविनायक- पाच मुखे, पाच दात (सुळे लांब- एकदंत), मधल्या सोंडेच्या दातावर तीन बारीक हत्ती कोरलेले आहेत.....*
*६. राक्षसारूढ गणपती- पंचशुण्डा (सोंड), दशभुजा (बाहू- हात) गणपतीचाच हा प्रकार असून, तो द्विमुखी राक्षसाच्या खांद्यावर बसला आहे. दिल्लीच्या विमल सेठ यांच्या संग्रहात हे दुर्मिळ काष्ठशिल्प आहे.....*
*७. हेरंब गणपती- सिंहावर बसलेला अभय (आशीर्वाद) मुद्रेतील हा गणपती आहे. मुशीगंज (बांगलादेश) येथे तो मिळाला आहे.....*
*याशिवाय बाल गणपती, देवीच्या पायाखाली गजानन वा हस्तिमुख (गजमुख) पुरुष, उच्छिष्ठ गणपती, लक्ष्मी गणपती, ऊर्ध्व गणपती, पिंगल गणपती, भक्ती गणपती असे प्रकार आढळतात.....*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸भारताबाहेरील गणेश.🔸*
*गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते... भारतातच नव्हे तर जगभरात गणपतीची पूजाविधी व उपासना प्रचलित असल्याचे दिसून येते.....*
*भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती सापडल्या आहेत... प्राप्त गणेशमूर्ती द्बिभूज व मोदकभक्षणरत आहेत. हातात मोदकभांडे, कुर्हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात.....*
*गणपतीची उपलब्ध प्राचीनतम मूर्ती इसवीसनाच्या दुसर्या शतकात श्रीलंकेत निर्मिली गेली... जावा बेटाच्या वाडा नामक जागी इसवीसनाच्या अकराव्या शतकातील बसलेल्या स्थितीतील मूर्ती मिळालेली आहे. या मूर्तीवर तंत्रमताचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. इंडोनेशियामध्ये इतरत्रही गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळालेल्या आहेत. यात खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वाधिक सुंदर आहे. ही मूर्ती चतुर्भूज असून , अभंगदेह , सुंदर डोळे, नागजानवेधारी, वाहन उंदीर अशी आहे. चारपैकी तीन हातात अक्षसूत्र, विषाण, मोदकभांडे आहे, चौथा हात अस्पष्ट आहे.....*
*स्रोत: आंतरजाल, bookstruck.in*
*संमोहित झालेली व्यक्ती, संमोहन करणाऱ्या व्यक्तीच्या सर्वच आज्ञा ऐकते का ?*
*शाळेत कोणीतरी समोर संमोहनाचा प्रयोग करून दाखवला असेल.४-५ मुलांना बोलावून त्यांना संमोहित केले असेल. संमोहित केल्यानंतर त्यांना गाणी म्हणायला व नाचायला लावले असेल. एवढेच काय, उकडत असताना "काय थंडी आहे बुवा” असे म्हणायला लावून त्यांना कुडकुडायलाही लावले असेल.*
*हे बघून अगदी हसताहसता पुरेवाट झाली असेल. गंमतीचा कळस म्हणजे प्रयोग करणारा संमोहित माणसाला सांगतो की, “तुझ्या समोर अमिताभ बच्चन बसला आहे (प्रत्यक्षात तेथे एखादा टेबल असतो!) तेव्हा त्याची मुलाखत घे;" ती व्यक्ती खोट्या अमिताभची मुलाखतही घेते.*
*वरील उदाहरणांमुळे अशी भीती वाटणे रास्त आहे की, कोणी संमोहित केले, तर ती व्यक्ती सांगेल ते कराल. चोरी कर म्हटले की चोरी करावी लागेल वगैरे. वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या, ज्यात १ बाई साधुच्या मागे निघून गेली, अशा प्रकारेच काही लिहिलेले असते, त्यांचाही हातभार लागतो; पण हे खरे असते काय ?*
*संमोहनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे इच्छा नसल्यास कोणी ही संमोहित करू शकत नाही. कारण संमोहन करणारा काय म्हणतोय, काय करतोय यावर लक्ष केंद्रितच केले नाही, तर संमोहित होणार नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे संमोहनावस्थेत देखील माणूस त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटणार नाहीत, अशा गोष्टी कधीही करणार नाही. सुशील अशा सज्जन स्त्रीला अंगावरचे कपडे उतरवायला कोणी भाग पाडू शकणार नाही व सज्जन मुलाला कोणी चोरी करायला लावू शकणार नाही. त्यामुळे संमोहन करणाऱ्याला घाबरण्याचे कारण नाही.*
*मजा म्हणून त्याचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही.....*
*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन...*
|| ॐकारस्वरूपम शिवपुत्राय नमो नमः ||*
*|| ॐ गं गणपतये नमः ||*
*|| जय गणेश ||*
हे मंगलमूर्ती श्रीगजानना! विनायका! शिवपार्वतीसुता!
प्रथम आम्ही तुझ्या चरणांना मनोभावे वंदन करतो. तुझ्या प्रेरणेनेच आम्ही ग्रंथारंभ केला आहे. कार्यसिद्धीसाठी तू आम्हाला मंगलमय आशीर्वाद दे.
श्रीगणेश हा शिव-पार्वतीचा सुपुत्र होय. श्रीगणेशास सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. तो सुखकर्ता, दुःखहर्ता आहे. अशा या विनायकाचे पुराण पृथ्वीतलावर ऐकण्यास दुर्लभ आहे. तुम्ही सर्वजण भाग्यवंत आहात त्यामुळे ही सुवर्णसंधी तुम्हाला मिळाली आहे. गणेश पुराणाचे वाचन, श्रवण केल्याने यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य याची प्राप्ती होते. आम्हाला श्री गणेश जशी प्रेरणा देईल त्या प्रमाणे आम्ही हे गणेश महात्म्य तुम्हाला सांगणार आहे. आपण ते शांतचित्ताने, भक्तीमय अंतकरणाने, श्रद्धापूर्वक वाचावे ही नम्र विनंती. हे पवित्र पुण्यकारक गणेश पुराण प्रथम महर्षी व्यासांनी भृगूंना, भृगुनी सोमकांत नृपास व सोमकांत राजाने हे सर्व लोकांना सांगितले. उद्यापासून आपण उपासना खंडातील काही कथा बघणार आहोत.
नमस्कार!
गणपतीच्या दहा दिवसात (किंवा आयुष्यभरासाठी) आपण एक छोटासा नियम पाळणार आहोत. सकाळी अंघोळ झाली कि प्रत्येकाने खालील *संकटनाशक गणेश स्तोत्र* म्हणायचे आहे. कोणाच्या घरी सव्वा दिवसाचा गणपती असो अथवा पाच किंवा दहा दिवसाचा असो ,आपण हा नियम निदान दहा दिवस काटेकोरपणे पाळणार आहोत.
*|| संकटनाशन गणेश स्तोत्र ||*
प्रणम्यं शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ।।१।।
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ।।२।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।३।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ।।४।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो ।।५।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६।।
जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८।।
।।इति श्री नारदपुराणे संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम्।। श्रीगजाननार्पणवस्तू: ||
*श्री गणेश पुराण कथा*
॥ श्री गणेशाय नम: ॥
*सोमकांत राजाची कथा*
सौराष्ट्र देशात देव नगरामध्ये फार फार वर्षापूर्वी सोमकांत नामक एक सत्वशील राजा होऊन गेला. तो वेदज्ञानी, धर्मनिष्ठ व प्रजादक्ष होता. त्याच्याजवळ कुबेराला ही हेवा वाटेल एवढे ऐश्वर्य होते. अशा या राजाचे पाच विश्वासू प्रधान होते. विद्याधीश, रूपवान, क्षमंकर,सुबल, ज्ञानगम्य अशी त्या पाच प्रधानांची नावे होती. हे सर्व प्रधान राजाप्रमाणे चतुरस्त्र होते. त्या सोमकांत राजास सत्वशील, सुविद्य, पतिव्रता पत्नी लाभली होती. सुधर्मा असे त्या राणीचे नाव होते. अशा या दांपत्यास देवाच्या कृपेमुळे एक बुद्धिमंत सुपुत्र लाभला होता. त्याचे नाव हेमकंठ. अशा या धर्मनिष्ठ ,प्रजादक्ष सोमकांत राजाला अचानक पूर्व कर्माप्रमाणे भयंकर कुष्ठरोग झाला. मनुष्याने केलेल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ त्याला व्यक्त किंवा अव्यक्त रुपाने त्याच जन्मी किंवा पुढील जन्मी मिळत असते.
कुष्ठरोगामुळे राजाला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. राजास वाटू लागले की आता आपल्या जीवनात रस नाही. त्यामुळे एके दिवशी राजाने आपले विश्वासू प्रधान ,सुपुत्र व प्रियतमा ला बोलावले व त्यांना आपली दुःखमय कहाणी सांगितली. सोमकांत राजा म्हणाला, “मी आजपर्यंत धर्माप्रमाणे आचार, विचार, उच्चार केले. मला पूर्वजन्मातील कर्म भोगावे लागत आहे. खरोखरच मानवी शरीर हे क्षणभंगुर आहे. केव्हा कोणता रोग या शरीरात उत्पन्न होईल हे काही सांगता येत नाही. या महारोगामुळे मला हे आयुष्य नकोसे झाले आहे. लोक कुचेष्टा करतात. त्यामुळे मला लोकांपुढे जाण्यास लाज वाटत आहे. मी आता ठरवले आहे की राजकुमार हेमकंठास राज्याभिषेक करून त्याच्याकडे संपूर्ण राज्यकारभाराची जबाबदारी सोपवायची. त्यानंतर मी वनात जाऊन परमेश्वराचे चिंतन करणार आहे.” राजाची प्रियतमा सुधर्मा म्हणाली, “स्वामी मी अग्नीसाक्षीने तुमच्याबरोबर विवाह केला आहे. तुम्हाला सर्वस्व अर्पण केले आहे. मी तुमच्या शिवाय राहू शकणार नाही. माझे पती परमेश्वर जिथे असतील तिथे मी येणार.”
आपल्या पिताश्रींचा दृढनिश्चय पाहून हेमकंठाने राज्यकारभार चालवण्याचे ठरवले. राजा हेमकंठास काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू लागला, “सदैव दुसऱ्याच्या कल्याणासाठी झिजावे. स्वतःचा स्वार्थ पाहू नये. दुसऱ्याची निंदा करणे किंवा त्याचा छळ करणे हे महापाप आहे. स्त्री, पैसा, मानसन्मान या गोष्टी लोकांपासून लपवून ठेवाव्या. अपेयपान करू नये. मुक्या प्राण्यांना ठार मारून त्यांचे मांस भक्षण करू नये व परधन, परस्त्रीबद्दल आसक्ती असू नये. सदैव धर्माप्रमाणे आचरण करावे हे लक्षात ठेव. राज्यकारभार करताना कोणी स्तुती करतील, तर कोणी निंदा करतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. राज्यकारभार करताना सदैव ईश्वराचे स्मरण असावे. यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सहा गुणांची वृद्धी करावी. तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या सहा दोषांपासून दूर रहावे.” अशा प्रकारे हेमकंठास सोमकांत राजाने एकांतात राजनीतीचा उपदेश केला.
त्यानंतर सोमकांत राजाने क्षेमकर, रूपवान व विद्याधिश या तीन प्रधानांना बोलावून राज्याभिषेकाची जय्यत तयारी करण्यास सांगितले. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सात पवित्र नद्यांचे पाणी आणले होते. राज्याभिषेकासाठी ब्राह्मण, नातेवाईक, मित्रमंडळी, देशोदेशीचे राजे आदींना निमंत्रणे देण्यात आली. प्रथम श्री गजाननाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुण्याहवाचन, मातृकापूजन, अभ्युदय, गंगार्पण इत्यादी धार्मिक विधी झाले. त्यानंतर सोमकांत राजाने स्वतःच्या करकमलानी हेमकंठाच्या मस्तकावर सुवर्ण राजमुकुट ठेवला. राज्याभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर सोमकांत राजाने ब्राह्मणांचे यथाविधी पूजन केले.
त्यानंतर सोमकांत वनवासात जाण्यासाठी निघाला. आपला अन्नदाता आपल्याला सोडून वनवासात चालला आहे हे कळल्यावर प्रजेला दुःख झाले. आपल्या जन्मदात्याचा विरह हेमकंठास सहन होईना. राजाने पुन्हा पुन्हा विनंती करून त्या लोकांना समजावले. हेमकंठाचा कंठ दाटून आला. हे बघून राजा सोमकांत म्हणाला, “आता तू माझी आज्ञा मानून नगरात परत जा व राज्यकारभार कर. तू पित्याची आज्ञा मोडता कामा नये. माझ्या या पाच प्रधानांनपैकी तीन प्रधानांना तुझ्याबरोबर ठेवतो. ते तुला मार्गदर्शन करतील. प्रजेचे प्रेमपूर्वक पालन कर. मी केलेल्या राजनीति प्रमाणे आचरण कर. मी जर पूर्ववत झालो, तर नक्की राज्यात परत येईल. तू काही काळजी करू नकोस.” आपल्या पिताश्रींच्या जड अंतकरणाने निरोप घेऊन त्यांच्या चरणांना वंदन करून हेमकंठ राजा आपल्या नगरीत जाण्यासाठी निघाला. नगरात जाण्याआधी हिमकंठाने आपल्या जन्मदात्रीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मदात्यांची आज्ञा मानून हेमकंठ पुन्हा आपल्या राज्यात आला. राजपुत्र पुन्हा राज्यात आल्याने सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. आपल्या वडिलांनी सांगितलेल्या राजनीतीप्रमाणे हेमकंठाने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.
हेमकंठास राज्याकडे पाठवल्यानंतर सोमकांत सपत्नीक, सुबल व ज्ञानगम्य या दोन विश्वासू प्रधानांसह निबीड वनात गेला. चौघेही एकमेकांच्या विचाराने वागत होते. प्रधान अरण्यात सुधा राजास मान देत होते. आपली पावले झपाझप पुढे टाकत ते एका सरोवराच्या तीरावर आले. त्या भागात अनेक ऋषी मुनींचे आश्रम होते. त्यांनी आश्रमासाठी निसर्गरम्य जागा निवडली होती. त्या आश्रमातले ऋषींचे शिष्यगण तसेच ऋषी सुद्धा सरोवरातील मधुर पाणी व कमळे नेण्यासाठी येत असत. त्यांना येथे मुक्त वातावरण लाभले होते. आपण जणू काही स्वर्गातच आलो आहोत असे त्यांना वाटत होते.
खूप चालून चालून सोमकांत राजाचे पाय दुखत होते. त्यामुळे त्याची प्रियतमा त्याचे पाय चेपीत बसली. त्यानंतर दोन्ही प्रधान पोटपूजेचा बंदोबस्त करण्यासाठी कंदमुळे व सुमधूर फळे आणण्यासाठी अरण्यात निघून गेले. सोमकांतला झोप लागली. सुधर्मा मात्र जागीच होती. तिला तळ्याजवळ एक पिळदार शरीरयष्टी असलेला तेजस्वी ऋषिकुमार दृष्टीस पडला. त्याला बघताच सुधर्मा चा आनंद गगनात मावेना. हा तेजस्वी महात्मा आपले कल्याण करण्यासाठी येथे आलेला आहे असे तिला वाटले. सुधर्माने त्या तेजस्वी ऋषीपुत्रास हाक मारली. तो ऋषिकुमार सुधर्माकडे आला व त्याने तिला वंदन केले. सुधर्मा म्हणाली, “हे तेजस्वी ऋषीपुत्रा तू कोण आहेस?” तिचा प्रश्न ऐकून ऋषिकुमार म्हणाला, “हे माते! माझे नाव चवण आहे. माझ्या पिताश्रींचे नाव भृगु ,मातोश्री चे नाव पुलोत्तमा आहे. कृपया आपला परिचय द्यावा. सुधर्मा म्हणाली, “हा पुरुष म्हणजे सोमकांत राजा होय. मी त्याची धर्मपत्नी सुधर्मा. सोमकांत राजाच्या पूर्व कर्मामुळे त्याला कुष्ठरोग झाला आहे. विवाहनंतर त्यांना कुष्ठरोग झाला आहे. आता या भयंकर रोगातून माझ्या पतीचा उद्धार कसा होईल हे मला समजत नाही.” सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून चवणास वाईट वाटले. तो तेथून काहीही न बोलता गेला व आपल्या कलशात जल भरून आश्रमात आला.
आपल्या पिताश्री समोर त्याने तो पाण्याने भरलेला कलश ठेवला व खाली मान घालून उभा राहिला. आपल्या सुपुत्राचे काहीतरी बिनसले आहे, त्याला कसलेतरी दुःख झाले आहे हे भृगु ऋषींनी ओळखले. चवनाने जन्मदात्यास सोमकांत राजाची सर्व हकीकत सांगितली. भृगू ऋषी म्हणाले, “अरे, तू यामुळे एवढा दुःखी का झालास? त्या सर्वांना घेऊन तु आश्रमात ये. आपण त्यांचे दुःख निवारण करू.” पिताश्रींच्या आज्ञेनुसार चवन पुन्हा सरोवरापाशी आला. भृगुपुत्र चवन सुधर्मास म्हणाला, “हे राजनंदिनी! माझ्या पिताश्रींनी आपणासर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे.” चवनाचे हे संभाषण ऐकून सुधर्मास आनंद झाला. ते पाचही जण ऋषींच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. अशाप्रकारे ती सर्व मंडळी ऋषींच्या आश्रमात आली. त्यांच्या शिष्यांनी सोमकांत राजा ,सुधर्मा राणी व दोन प्रधानांचे सहर्ष स्वागत केले. आश्रमात सर्वत्र वेदघोष सुरू होता. आश्रमात अनेक हिंस्त्र पशु सुद्धा होते. ते एकमेकांशी हाडवैर विसरून मुक्तपणे हिंडत होते. तेथे सुशितल पवन होता. त्या आश्रमात भृगुऋषी व्याघ्रचर्मवर शांत चित्ताने बसले होते. त्यांची मुद्रा तेजस्वी दिसत होती. त्यांचे दर्शन झाल्यावर सर्वांनी त्यांना नमस्कार केला. भृगु ऋषींनी सर्वांना मंगलमय आशीर्वाद दिले.
नंतर सोमकांत राजा पुढे आला व हात जोडून नम्रपणे म्हणाला, “हे मुनिवर, आपली कीर्ती त्रैलोक्यात पसरली आहे. माझे भाग्य थोर म्हणून आज मला आपले दिव्य दर्शन झाले. स्वामीजी माझ्याकडे कशाची कमतरता नव्हती. मी माझ्या जीवनात सदैव सत आचार, सत विचार, सत उच्चाराचे पालन केले. मी शंभू महादेवाची भक्ती सुद्धा केली. असे असून सुद्धा मला कुष्ठरोग झाला. आपणच मला या दुर्धर व्याधीतून मुक्त करा. आपण शिग्रतेने काहीतरी उपाययोजना करावी. मला या रोगाचा कंटाळा आला आहे. काही काही वेळा आत्महत्या करावी असे वाटते, पण आत्महत्या पाप आहे याची जाणीव असल्याने मी मनाला समजावतो. आता तुम्हीच मला या दुर्धर रोगापासून मुक्त करा, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे.”
सोमकांत राजाची विनंती ऐकून तपस्वी भृगु ऋषी म्हणाले, “राजन, तू काळजी करू नकोस. आपल्या सर्वांचे काळजी घेणारा परमेश्वर आहे. त्याच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. मला तुझे परम दुःख कळाले आहे. माझ्याकडे त्यावर जालीम औषध सुद्धा आहे. हे सर्व तुला पूर्वजन्मीच्या भयंकर पापामुळे भोगावे लागत आहे. ईश्वर सर्वांना सर्व कर्माची फळे व्यक्त-अव्यक्त रूपात देत असतो. मनुष्याने सदैव ईश्वराचे स्मरण करावे. त्यामुळे त्याच्या हातून नेहमी चांगलीच कर्मे होतात. तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या शत्रूंवर विजय मिळवता आला पाहिजे. तू पूर्वजन्मी कोणते महापाप केले होतेस, हे मी तुला दिव्य दृष्टीने सांगेन. तू आता निवांत हो.” भृगु ऋषींच्या संभाषणाने सुधर्मास हायसे वाटले. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजन झाल्यानंतर सर्वजण निद्राधीन झाले. सोमकांत राजास झोप केव्हा लागली हे सुधर्मास कळले सुद्धा नाही. एवढा परमानंद सोमकांत राजास राजवाड्यात असताना सुद्धा झाला नव्हता.
त्या रात्रीनंतर भृगु ऋषी प्राप्त:काळी उठले. त्यांनी आपल्या एका शिष्याकडून सोमकांत राजास बोलावले आणि आपल्या दिव्य दृष्टीने सोमकांत राजाचे पूर्वजन्माचे चरित्र सांगण्यास प्रारंभ केले. ते म्हणाले, “फार फार वर्षापूर्वी विंध्यपर्वता जवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. या नगरीत एक धनाढ्य वैश्य राहात असे. त्याचे नाव होते चिद्रूप. त्याला सुविद्य, सुशील, पतिव्रता प्रियतमा लाभली होती. तिचे नाव शुभगा. त्यांना खूप वर्ष झाली तरी मुलबाळ नव्हते. त्यांना देवाच्या कृपेमुळे वृद्धापकाळी एक पुत्र लाभला. त्यांनी त्याचे नाव कामंदा ठेवले. त्याच्या आई-वडिलांना त्याचे फार लाड केले. त्याला लाडाने वेडे केले. त्याने आई-वडिलांच्या संमतीशिवाय एका तरुणीशी विवाह केला. ती तरुणी दिसायला लावण्यवती होती. त्यांनी आपल्या लाडक्या सुनेचे नाव कुटुंबिनी असे ठेवले. ती पतिव्रता होती. अशा या थोर पतिव्रता स्त्रीस सात पुत्र व पाच कन्या लाभल्या. या मुळे चिद्रूप व त्याच्या पत्नीस आनंद झाला. ते दोघेही वृद्धपणी नातवंडांच्या बाललीलात रमू लागले. काही दिवसांनी दोघेही गतप्राण झाले.
आई-वडिलांच्या निधनानंतर सर्व संपत्ती कामंदाच्या हाती आली. कामंदाला संपत्तीचा गर्व झाला. त्याने अविचाराने संपत्ती उडविण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्या धर्मपत्नीने त्याला खूप समजावून सांगितले, पण त्याने ऐकले नाही. थोड्या दिवसातच कामंदा संपत्तीरहित झाला. तो अनेक प्रकारची कट-कारस्थाने करू लागला. लोकांना फसवू लागला. तो अपेयपान करू लागला. अशा या स्त्रीलंपट, लबाड कामंदाच्या हरकती मुळे जनता त्रस्त झाली. कामंदा विरुध्द नृपाकडे तक्रार केली. त्याची शिक्षा म्हणून राजाने कामंदास नगराबाहेर हाकलून दिले. त्याने अरण्यात मुक्काम ठोकला.
अरण्यात येणाऱ्या वाटसरूंना लुटून तो ठार मारत असे. तो अरण्यातील पशु पक्षांना ठार मारून आपले पोट भरू लागला. असे करता करता त्याच्या जवळ अमाप संपत्ती जमा झाली. त्याने अरण्यात मोठे घर बांधले. हाताखाली दहा गुंडांना कामासाठी ठेवले. त्यांच्या हातून अनेक ब्रम्हहत्या झाल्या होत्या. त्याच्या तारुण्याचा जोम हळूहळू कमी होऊ लागला. त्याने प्रौढत्वात पदार्पण केले. प्रौढत्वात सुद्धा त्याने अनेक लोकांची निर्घृण हत्या केली. निसर्ग नियमाप्रमाणे त्याने प् प्रौढत्वातून वार्धक्यात पदार्पण केले. वार्धक्यात त्याला धड चालता येईना, बोलता येईना. हात पाय थरथरू लागले. त्याच्या नोकर-चाकराना, तसेच पुत्रांना, मित्रमंडळींना हा केव्हा एकदा देवाघरी जातोय असे वाटू लागले. त्याला अचानक एका ब्राह्मण सख्याची आठवण झाली. त्या सख्यास सांगून इतर ब्राह्मणांना कामंदाने आपल्या घरी बोलावले.
त्याने ब्राह्मण समुदायास प्रथम नमस्कार केला व म्हणाला, “हे ब्राह्मण जनहो, माझ्या हातून अनेक पापे झाले आहेत. मला मरणापूर्वी पुण्यकर्म करायचे आहे. त्यामुळे मी आपणा सर्वांना शंभर सुवर्णमुद्रा दान करणार आहे.” त्या ब्राह्मण समुदायातील दोन ब्राह्मण म्हणाले, “शिवं शिवं! अरेरे ! तुझ्यासारख्या महापापी चांडाळाकडून आम्ही दान स्वीकारणार नाही.” ब्राह्मणांकडून नकार मिळाल्यानंतर कामंदास आपल्या हातून केवढे महापाप झाले आहे याची जाणीव झाली. कामंदा ज्या अरण्यात राहत होता, त्या घनदाट अरण्यात एक श्री विनायकाचे जुने देऊळ होते. ते देऊळ खूप वर्षापूर्वींचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार करून आपण पुण्यप्राप्त करावे असे कामंदाने ठरवले. त्यानंतर ताबडतोब आपल्या जवळ असलेल्या सर्व पैशांनी जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. त्यांनी अत्यंत मनमोहक मंदिर बांधले. अशाप्रकारे कामंदाचे होते तेवढे बहुतेक धन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात खर्च झाले. उरलेले सर्व धन नातेवाईकांनी पळवून नेले. नातेवाईकांना मानसन्मानाची, पैशाची अपेक्षा असते. जरा काही चूक झाली की ते पिसाळलेल्या सिंहाप्रमाणे भांडण्यासाठी येतात. मनुष्याने परमेश्वराची थोडीजरी भक्ती केली तरी तो परमेश्वर आनंदित होतो. त्याला शुद्ध प्रेमाची अपेक्षा असते.
काही महिन्यानंतर कामंद देवाघरी गेला. प्रथम यमदुतांनी त्याला चाबकाचे फटके दिले, दगडांनी मार मार मारले, उकळत्या तेलाच्या कढईत फेकून दिले. यमाने चित्रगुप्तास विचारले कि याचे पापपुण्य किती आहे? चित्रगुप्ताने आपल्या नोंदवहीत पाहिले व सांगितले, याचे पाप खूप आहे, त्यामानाने पुण्य थोडे आहे. यमाने कामंदास विचारले की, प्रथम पुण्य भोगणार की पाप भोगणार लवकर सांग. कामंदा म्हणाला, यममहाराज मला प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा आहे. त्यामुळे यमाने त्याला सौराष्ट्र देशातील राजघराण्यात जन्माला घातले. तोच महापापी कामंदा म्हणजे तू आहेस राजन. तुझ्या पुण्याईमुळे तुला हा जन्म लाभला आहे.” हि पूर्वजन्मीची कथा भृगु ऋषींनी राजास सांगितली.
भृगु ऋषींनी आपल्याला खोटेच सांगितले असे सोमकांत राजास वाटू लागले. तेवढ्यात एक अद्भुत चमत्कार झाला, अचानक घारी सारखे मोठे पक्षी येऊन सोमकांत राजास आपल्या चोचीने मारू लागले. ऋषी म्हणाले, “हे राजन, ऋषीमुनी असत्य भाषण करीत नाही. असे असताना तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, त्यामुळे हे पक्षी तुला त्रास देत आहेत.” असे म्हणून ऋषींनी एकदा हुंकार देताच ते पक्षी निघून गेले. त्यानंतर सोमकांत राजाने भृगु ऋषींना साष्टांग नमस्कार करून त्यांची क्षमा मागितली. तपस्वी, महाज्ञानी भृगु ऋषींनी नंतर क्षणभर ध्यान केले. या ध्यानामध्ये त्यांनी सोमकांत राजाच्या पूर्व कर्माचे अवलोकन केले व पुढे म्हणाले, “हे राजन, तुझे पूर्वजन्मीचे पाप खूप आहे. तू पूर्वजन्मी अनेक महापापे केली आहेस. त्यामुळे ती सर्व पापे नष्ट करण्यासाठी कोणताही उपाय उपयोगी पडणार नाही. पण एक रामबाण उपाय आहे. तू पुण्यमय गणेश पुराणाचे भक्तीमय अंतकरणाने श्रवण केल्यास पापक्षालन होईल, यात काहीही शंका नाही. तो श्री गणेश सुखकर्ता आहे तसेच दुःखहर्ता आहे”
असे म्हणून भृगु ऋषींनी आपल्या कमंडलूस स्पर्श करून एक सहस्त्र गणेशाचे नावे उच्चारली. त्यानंतर त्या कमंडलूतील मंतरलेले जल सोमकांत राजाच्या अंगावर शिंपडले. त्यानंतर राजाच्या नासिकाग्रातून एक अत्यंत सूक्ष्म पुरुष बाहेर पडला. थोड्याच कालावधीत तो एवढा वाढला की त्याची उंची सात वृक्ष पेक्षा जास्त झाली. तो माणूस अत्यंत काळाकुट्ट होता. त्याच्या मुखातून रक्त,पु यांसारखे अनेक पदार्थ बाहेर येत होते. हा अक्राळविक्राळ मनुष्य आपणास यमलोकी पाठवणार असे त्यांना वाटू लागले. भृगु ऋषी घाबरले नाहीत. त्यांनी मोठ्या धिराने त्या मनुष्यास विचारले, “हे राक्षसा, तू कोण आहेस?” तर राक्षस म्हणाला, “मी पुण्यपुरुषांचा जुळा भाऊ पापपुरुष आहे. मी प्रत्येक मनुष्याच्या शरीरात राहत असतो आणि सात्विक आचरणाचे माणसे असतात ती माझ्या भावाचे ऐकतात. जी राजस आचरणाची माणसे असतात ती आमच्या दोघांचेही ऐकतात व जी पापी माणसे म्हणजे तामसी आचरणाची माणसे असतात ती फक्त माझे ऐकतात. माझ्या ऐकल्यामुळे अनेक पापी लोकांचा नाश झाला आहे. आपल्या मंत्र प्रभावाने मी राजाच्या शरीरातून बाहेर आलो.” त्या राक्षसाचे बोलणे ऐकून भृगू ऋषी म्हणाले, “आता मी सांगतो तेथे जा. पुन्हा येथे येऊ नकोस. समोर जो आम्रवृक्ष आहे त्याच्या ढोलीत जाऊन बस व झाडांची वाळलेली पाने खाऊन पोट पूजा कर.” राक्षस गेला त्याने आम्रवृक्ष स्पर्श करताच त्या झाडाचे भस्म झाले. त्यावर भस्माच्या ढिगात तो लपून बसला.
हे पाहून ऋषी म्हणाले, “राजन, तू अतिशय पुण्यकारी पुण्यवर्धक श्री गणेश पुराण शांतचित्ताने श्रवण कर. म्हणजे त्या दिव्य पुण्याइने आम्रवृक्ष पूर्ववत होईल व तू पापातून मुक्त होशील.” सोमकांत राजा म्हणाला, “मुनीवर, मी श्रीगणेश पुराण कोठेही पाहिले नाही किंवा श्रवण सुद्धा केले नाही. मी श्री गणेश पुराण ऐकण्यासाठी कोणाकडे जाऊ? याचे तुम्ही मार्गदर्शन करा.” ऋषी म्हणाले, “हे वत्स ! तुला श्रीगणेश पुराण श्रवण करण्यासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. पूर्वी विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवांनी हे पुण्यमय पुराण महर्षी व्यासांना सांगितले. मी स्वतः महर्षी व्यासांकडून श्रवण केले आहे. तुझी तीव्र इच्छा असेल तर मी ते सांगण्यास तयार आहे. पण तू ते श्रद्धापूर्वक ऐकले पाहिजे. प्रथम तू सरोवरात जाऊन स्नान करून ये.” त्यानंतर सोमकांत राजा सरोवरावर गेला. तेथे स्नान केले. ओंजळीत जल घेऊन सूर्यनारायणाच्या साक्षीने गणेश पुराण श्रवण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर ते जल सरोवरास अर्पण केले. त्या संकल्पामुळे राजाचा दुर्धर असा कुष्ठरोग ताबडतोब बरा झाला. आसनावर बसल्या नंतर सोमकांत राजा म्हणाला, “श्रीगणेश पुराण खरोखरच दिव्य आहे. ते ऐकण्याचा मी आज संकल्प केला व ताबडतोब माझे शरीर रोगमुक्त झाले. शिवपार्वतीसुत खरोखरच सुखकर्ता व दु:खहर्ता आहे.” ऋषी म्हणाले, “बरे झाले तुझी तुलाच खात्री पटली.हे पुण्यमय श्रीगणेश पुराण जे वाचतील वा श्रवण करतील त्यांची जन्मजन्मांतरी पापे नष्ट होऊन जातील. त्यांच्या घरात सुख, शांती, समाधान नांदेल. या गणेश पुराणाचे श्रवण वाचन केल्यामुळे कलियुगात मनुष्यप्राणी भवसागरात तरून जाईल. त्यामुळे मी आता गणेश पुराण सांगण्यास प्रारंभ करतो.”
भृगू ऋषी सांगू लागले, “नारायणाच्या एका अंशापासून महर्षी व्यास निर्माण झाले. महर्षी व्यास महान तपस्वी तसेच ज्ञानी सुद्धा होते. त्यांनी एका वेदाचे चार विभाग केले. ते चार विभाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. हे चार वेद मनुष्याने समजावून घेतले पाहिजेत ,त्यांनी वेदाचे ज्ञान समजावून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी त्यांनी पुराने रचण्यास सुरुवात केली. त्यांना ज्ञानाचा गर्व झाला होता. आपल्यासारखा ज्ञानी पुरुष या त्रैलोक्यात कोणीही नाही असे त्यांना वाटू लागले. पुराने रचण्यापूर्वी आपली दिव्य रचना निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून त्यांनी श्री गजाननाचे किंवा इतर कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली. त्यांना आपण पुढे काय लिहावे हे सुचेना. त्यांना स्मृतिभ्रंश होऊ लागला. काही आठवेना.
याचे कारण विचारण्यासाठी ते विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी थोडा विचार केला व म्हणाले, “हे वत्सा ! कोणतेही कार्य हाती घेण्यापूर्वी त्याचा सर्वांगाने विचार केला पाहिजे. कोणत्याही कार्य करताना मनामध्ये नम्रता असावी. गर्वाने कोणत्याही कार्यास सुरुवात केल्यास अनेक विघ्नांचा सामना करावा लागतो. आपण त्रैलोक्यात ज्ञानी आहोत असा तुला गर्व झाला होता, त्यामुळे शारदा तुझ्यावर चिडली व तुझी मती कुंठीत झाली. तू कोणतेही कार्य करण्यापूर्वी मंगलमूर्ती श्री गजाननाचे स्मरण करत जा. श्री गणेश सहस्त्रनामावलीने गणेशाची पूजा करत जा. श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे. कोणत्याही कार्याच्या प्रसंगी, प्रथम श्री गणेशाचे पूजन करणे आवश्यक आहे. त्याला सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. प्रत्येक मनुष्याने रोज स्नान केल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र किंवा श्री गणेश सहस्त्रनामावली म्हणणे आवश्यक आहे. ज्या मनुष्यावर मंगलमूर्ती प्रसन्न असतो, त्याच्यावर सर्व देवदेवता संतुष्ट असतात. आता तू आश्रमात जाऊन प्रथम श्री गणेशाचे पूजन कर. त्याच्या कृपेने तुझी बुद्धी पूर्ववत होऊन तुला पुराण लिखाणास प्रारंभ करता येईल.” ब्रह्मदेवांचा उपदेश ऐकल्यानंतर श्री महर्षी व्यास म्हणाले, “हे करुणासागरा, माझी मती कुंठित झाल्याने मला स्मृतिभ्रंश झालेला आहे. त्यामुळे हा शिवपार्वतीसुत श्रीगणेश कोण? त्याचे सहस्त्रनाम कोणकोणती आहेत? त्याच्या वेगवेगळ्या भक्तांच्या कथा सुद्धा आपण मला सांगाव्यात. त्याने घेतलेल्या विविध अवतारांबद्दल सुद्धा मला सर्व काही सांगा.”
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
*त्रिपुरासुराची कथा*
भृगु सोमकांतास पुढील कथा सांगू लागले.
श्रीगणेशाच्या कृपेने गृत्समदाची पुढे थोर कीर्ती झाली. त्याला मंत्रद्रष्टा ऋषी म्हणून मान्यता मिळाली. एके दिवशी त्याला जोराची शिंक आली. तिच्या आवाजाने भूमी थरथरली, नभोमंडल दणाणले. त्यातून एक तेजस्वी बालक प्रकट झाले. त्याला पाहून गृत्समदास मोठे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “बालका तू कोण आहेस?” तो म्हणाला, “हे मुनी, आपण सर्वज्ञ असूनही असे का विचारता? तुमच्या शिंकेतून मी आत्ताच जन्माला आलो आहे. मी तुमचाच पुत्र आहे.” बालकाचे ते बोलणे ऐकून गृत्समद थक्कच झाला. त्याला आपल्या मातेच्या मुकुंदाच्या शापाचे स्मरण झाले. हा पुत्र दुष्ट व क्रूर तर नसेल? या कुशंकेने त्याच्या मनात घर केले. हा पुत्र आपल्याला लाभलेला आहे, आपण त्याच्यावर चांगले संस्कार घडवायचे असा त्याने मनोमन निश्चय केला. त्या पुत्राला त्याने गणेश भक्तीचे माहात्म्य सांगितले. त्याला *गणानां त्वा* या गणेश मंत्राचा उपदेश केला.
पितृआज्ञेने त्या बालकाने मंत्रानुष्टानास सुरुवात केली. त्याने पाच हजार वर्षे तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने तो अत्यंत तेजस्वी दिसू लागला. ही त्याची खडतर साधना पाहून गणपती अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी गृत्समदाच्या पुत्रास प्रत्यक्ष दर्शन दिले. गणपती म्हणाले, “बाळ ! तू महान तपस्वी आहेस. तुझा भक्तीभाव आणि उपासने वरची श्रद्धा पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घे.” तो म्हणाला, “हे परमेष्ठी! तुम्हाला नमस्कार असो. तुमच्या मनात मला काही द्यायचे असेल तर, चराचर सृष्टीसहित संपूर्ण ब्रम्हांडावर माझे प्रभुत्व राहील असे वरदान द्या. माझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. अंती तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा.” गणपतीने ‘तथास्तु’ म्हणून आशीर्वाद दिला. गणपती पुढे म्हणाले, “वत्सा! एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुप्याचे अशी तीन पुरे तुला प्राप्त होतील. त्यामुळे तू सर्वांना अजिंक्य होशील. भगवान शंकराशिवाय कोणीही तुझा पराभव करु शकणार नाही. या तीन पुरामुळे तू त्रिपुर नावाने विख्यात होशील व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या अंतसमयी शंकर ही तिन्ही पुरे एकाच बाणाने नष्ट करतील. शिवांकडून मरण आल्यावर तू मुक्त होशील.” त्रिपुराला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावले.
बंगाल प्रांतातील त्या पवित्र तपोभूमीत त्रिपुराने सुंदर गणेश मंदिर बांधले. तेथे गणेशपुर नावाचे नगर वसविले. बघता बघता त्याने संपूर्ण पृथ्वीवर आपले अधिराज्य प्रस्थापित केले. पुढे त्याने पातळावर स्वारी केली. तेथेही आपली सत्ता कायम केली. त्रिपुराने मल्लविद्येचे कौशल्य पणाला लावून इंद्राला खाली पाडले. त्याच्या पायाला धरून वेगाने गरागरा फिरवून दूर भिरकावून दिले. देवाने त्याचा खूप शोध घेतला. तो एका पर्वताच्या कपारीत मूर्च्छित आढळला. देवाने उपचार करून त्याला शुद्धीवर आणले. त्या आणीबाणीच्या युद्धात देवांचा दारुण पराभव झाला. त्यांनी पलायन केले आणि हिमालयाच्या दर्या खोर्यांचा आश्रय घेतला.
त्रिपुराने इंद्राच्या राजधानीवर, अमरावतीवर ताबा मिळवला. त्रिपुराचा पराक्रम विलक्षण होता. त्याच्या भीतीने देव दिवाभीताचे जिने जगू लागले. विष्णुने क्षीरसागरात दडी मारली. ब्रह्मदेव कमळात लपले. चंड व प्रचंड हे त्रिपुराचे मानसपुत्र. त्या दोघांना त्याने वैकुंठ आणि सत्यलोकांचे अधिपती केले. मग त्याने कैलासावर आक्रमण केले. त्रिपुराचा पराक्रम पाहून शंकर प्रसन्न झाले व त्यांनी त्याचे कौतुक केले. बक्षीस म्हणून कैलासच त्याच्या स्वाधीन केले. पार्वती, नंदी आणि आपल्या गणांसह ते मंदार पर्वतावर निघून गेले. भीमकाय हा त्रिपुराचा सेनापती भूलोकीची सत्ता हाती आल्यावर त्याने मोठा उत्पात मांडला. धर्मकर्मे बंद करण्यासाठी त्याने खूपच अत्याचार केले. वज्रद्रष्टानेही पातळ आतंकित केले. अशाप्रकारे सर्वत्र आपला अंमल प्रस्थापित करून त्रिपुराने प्रदीर्घ काळ निष्कंटक राज्योपभोग घेतला.
हिमालयाच्या आश्रयार्थ गेलेले इंद्रादी सर्व देव त्रिपुराच्या वधाचा उपाय शोधत होते. त्यांची दुरवस्था पाहून नारदांनी त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “हे देवांनो, गणपतीच्या कृपाप्रसादाने त्रिपुरासुराला त्रिभुवनाची सत्ता प्राप्त झाली आहे. त्याने हजारो वर्ष गणपतीची एकनिष्ठेने आराधना केली म्हणूनच त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तुम्हाला त्रिपुरासुराचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्ही गजाननाला शरण जा.” नारदांनी त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि ते विश्वसंचारार्थ निघून गेले. नंतरच्या काळात सर्व देवांनी एकाक्षर मंत्राचा जप करून प्रदीर्घ तपश्चर्या केली. त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपतीनी देव कार्यासाठी स्वतःला प्रकट केले.
देवांनी आठ श्लोकी संस्कृत स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली. हे स्तोत्र संकटनाशन स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. ‘जो भाविक नित्यनेमाने या स्तोत्राचा प्रेम, भक्तिपूर्वक पाठ करेल त्याची सर्व संकटे दूर करीन’ असा त्या स्तोत्राला गणपतीचा आशीर्वाद आहे. गणपतीने त्या सर्वांचे मधुर शब्दांनी सांत्वन केले व त्यांना धीर दिला. गणपती म्हणाले, “भगवान शंकर त्रिपुराचा पराभव करतील.” ते आश्वासक बोलणे ऐकून देव समाधान पावले.
*श्री गणेश पुराण कथा (ब)*
*त्रिपुरासुराचा वध*
गजाननाने एक तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेतले. तो ब्राह्मण अमरावतीस त्रिपुराच्या राज्यसभेत प्रवेशला. त्रिपुरासुराने त्याचे स्वागत केले. तो ब्राह्मण म्हणाला, “दैत्यराज, मी कलाधर आहे. मी चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमध्ये पारंगत आहे.” कलाधररुपी गणपतीने त्याच्या समक्षच स्वकौशल्याने तीन विमाने तयार केली. तो त्रिपुरासुरास म्हणाला, “दैत्यराज, या विमानाच्या साह्याने तु क्षणार्धात कोठेही जाऊ शकशील. या विमानाचा कोणीही भेद करू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शंकराने जर एकाच बाणाने या तीनही विमानांचा अर्थात पुरांचा भेद केला तर तुला त्याच क्षणी मृत्यू येईल.” ती कलाधर निर्मित विमाने आपल्याच मृत्यूचे कारण आहेत, हे त्रीपुराने जाणले नाही. ती विमाने पाहून त्याला खूपच आनंद झाला. तो कलाधरला म्हणाला, “हे विप्रश्रेष्ठ! मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तरी निशंक मनाने जे हवे आहे ते मागून घे.” कलाधर म्हणाला, “हे दैत्याधिपती, पूर्वी मी कैलासपर्वतावर गेलो होतो. तेथे चिंतामणी गणेशाची फारच मनोहर मूर्ती पाहिली. ती मला खूपच आवडली होती. ती माझ्यापाशी असावी अशी माझी उत्कट इच्छा आहे. म्हणून मला काही द्यायचेच असेल तर ती गणेश मूर्ती आणून दे.” त्रिपुर म्हणाला, “एवढेच ना? मी तुझी इच्छा लवकरच पूर्ण करतो.”
त्रिपुरासुराने दूत पाठवून शंकराकडे चिंतामणी गणेश मूर्तीची मागणी केली. ती शंकरांनी साफ धुडकावून लावली. दूत निराश होऊन रिकाम्या हाताने परतला. ते पाहून त्रिपुराला प्रचंड संताप आला. त्याने बलाढ्य दैत्यसेनेसह मंदार पर्वतावर चढाई केली. त्रिपुरासुर युद्धाला ठाकलेला पाहून शंकराने ही आपल्या सर्व गणांना युद्धाची तयारी करण्यास सांगितले. त्यावेळी गणपतीचे पूजन न करतातच शंकर युद्धासाठी निघून गेले. बघता बघता दोन्हीकडचे वीर एकमेकांवर चढाई करून गेले. तुंबळ युद्ध सुरु झाले. एकच रणधुमाळी माजले. मंदार पर्वतावर रक्ताच्या नद्या उगम पावल्या, त्यात वीरांची मस्तके, त्यांची धडे व भग्न अवयव वाहताना दिसू लागले. संतापलेल्या त्रिपुराने देवसेनेवर भयंकर अग्न्यस्राचा प्रयोग केला. देवसैन्य आणि शिवगण हतबल झाले. शंकरानेही युध्द भूमीवरून काढता पाय घेतला.
या विजयाच्या उन्मादात त्रिपुरासुराने पार्वतीचे हरण करण्याचा निश्चय केला. हे वृत्त कळताच पार्वती भयभीत झाली. ती सूक्ष्म रूपाने आपल्या पित्याकडे हिमालयाकडे निघून गेली. त्याने तिला अत्यंत दुर्गम आणि गुप्त स्थानी लपविले. त्रिपुरासुराने मंदार पर्वतावर पार्वतीचा कसून शोध घेतला. पण ती हाती लागली नाही, चिंतामणी गणेश मूर्ती मात्र सापडली. जिच्यासाठी शंकराशी युद्ध करावे लागले, ती मूर्ती सापडल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेना. त्याने ती मूर्ती कलाधरास देण्यासाठी आपल्याबरोबर घेतली आणि तो माघारी वळला. एवढ्यात ती अदृश्य झाली. या घटनेने त्रिपुरासुराला मोठे आश्चर्य वाटले.
देवासहित प्रत्यक्ष शंकराचा आपण पराभव केला म्हणून त्रिपुरासुराला फारच उन्माद चढला. त्यावेळी नारदांनी शंकरांची भेट घेतली. ते म्हणाले, “महादेवा! आपण चिंतामणी गणेशाची पूजा न करताच त्रिपुराशी युद्ध केलेत, म्हणून हि पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे. श्रीगणपतीच्या वरदानानेच त्रिपुराला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे लक्षात घ्या. त्याचा युद्धात पराभव करायचा असेल तर तुम्हालाही गणपतीची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही त्रिपुरासुराशी युद्ध करा, म्हणजे यश तुम्हालाच मिळेल. महादेवांना ही नारदाचे म्हणणे पटले.
त्यानंतर महादेवांनी दंडकारण्यातील एकांतात एकाग्रतेने श्रीगणेशाची आराधना केली. तेव्हा दिव्य आणि विलक्षण रुपात श्रीगजानन प्रकट झाले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. महादेवांनी गणपतीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तेव्हा गणपती म्हणाले, “हे महादेवा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. यापुढे संकटसमयी तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या त्या वेळी मी त्या संकटाचे निवारण करीन. युद्धप्रसंगी माझ्या बीजमंत्राने अभिमंत्रित केलेला बाण तुम्ही त्रिपुरासुराच्या विमानावर सोडा. ती तिन्ही पुरे एकाच वेळी नष्ट करण्यासाठी हा एकमात्र उपाय आहे. हि तिन्ही पुरे नष्ट झाल्याबरोबर त्रिपुरासुर सामर्थ्यहीन होईल. मग त्याचा नाश करणे तुम्हाला अशक्य नाही. आता मी तुम्हाला माझे सहस्त्रनामस्तोत्र सांगतो. या सहस्त्रनामावली च्या नित्य श्रवण पठणाने माझ्या भक्ताच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. गणपतीने शंकरांना आपली सहस्त्रनामे सांगितली.
शंकराने तपश्चर्येच्या स्थानी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेथे मनोहर देवालय बांधले. त्या परिसरात मनिपुर नामक नगर वसवले. श्रीगणेश सहस्त्रनाम स्तोत्राची गणपती ही देवता, गं हे बीज, पुष्कल हा छंद, तुडे ही शक्ती आणि स्वाहा हे कीलक आहे. गणेश्वर:, गणक्रिड:, अशा नामाने या स्तोत्राचा प्रारंभ होतो आणि अनंतनामः, अनंतश्री:, अनंतोमुनिसंस्थित: अशा नामाने ते पूर्ण होते. ‘पहाटेस ब्रह्ममुहूर्तावर या स्तोत्राचा शांत चित्ताने, एकाग्रतेने व भक्तिभावाने नित्यपाठ करणाऱ्या उपासकाला जगातील सर्व प्रकारची सुखे व सर्व प्रकारची दैवी संपत्ती प्राप्त होईल, तो सर्व सद्गुणांनी युक्त होईल. त्याचे इहंपर कल्याण होईल.’ असा श्रीगजाननाचा या स्तोत्राला आशीर्वाद आहे.
श्रीगणपती कडून त्रिपुरासुराच्या वधाचे रहस्य आणि वरदान प्राप्त झाल्यामुळे शंकरांना खूपच आनंद झाला. हे वृत्त कळताच त्रिपुरासुराने हि युद्धाची जय्यत तयारी केली आणि तो देवावर चढाई करून गेला. उभयपक्षी तुंबळ लढाई झाली. तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करायचाच असा निश्चय केला. त्यांनी पृथ्वीचा रथ केला, त्याला सूर्य व चंद्र हे दोन चाके जोडली. ब्रह्मदेव हे त्या रथाचे सारथी झाले. अश्विनीकुमार हे रथाश्व झाले. शंकराने मेरू पर्वताचे धनुष्य केले. बाण म्हणून श्रीविष्णूची योजना केली. श्रीगणेश सहस्त्रनामावलीचा पाठ केला. एकाग्रचित्ताने एकाक्षर मंत्राचा जप केला. विष्णुरूपी बाणाची विधिवत पूजा करून त्यास अभिमंत्रित केले. शंकराने अभिमंत्रित विष्णूबाण धनुष्यावर चढविला. तो त्रीपुराच्या दिशेने सोडला. त्या महातेजस्वी बाणाने त्रिपुरासुराची तिन्ही पुरे एकाच वेळी भेदली. ती जळून भस्मसात झाली. त्या बाणाने मूर्च्छित झालेला त्रिपुरासुर पुन्हा उठलाच नाही. त्याच्या देहातून निघालेली प्राणज्योत शिवाच्या शरीरात प्रविष्ट झाली. त्यावेळी ‘त्रिपुर मुक्त झाला’ अशी आकाशवाणी झाली.
त्रिपुराच्या वधाने संपूर्ण त्रिखंडात आनंदाला उधाण आले. इंद्र सिंहासनारूढ झाला. देवता आपापल्या अधिकारानुसार पुन्हा कार्यरत झाले. सृष्टीचक्र पूर्वपदावर आले. शंकराने कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध केला, त्यामुळे शंकराला त्रिपुरारी व त्या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले. या प्रसंगाचे स्मरण म्हणून घरोघरी दीपोत्सव करण्याची प्रथा रूढ झाली.
*श्री गणेश पुराण कथा (क)*
*हिमालयाकडून पार्वतीस गणेशव्रताची माहिती व गणेश भक्तांच्या कथा*
शंकर रणांगणातून निघून गेल्यावर त्रिपुरासुर पार्वतीच्या हरण करण्यासाठी मंदार पर्वतावर गेला होता. पण तत्पूर्वीच ती आपल्या पित्याकडे हिमालयाकडे निघून गेली होती. त्याने पार्वतीला एका गुप्त दुर्गम गुहेमध्ये लपून ठेवले. त्रिपुरासुर निवर्तल्याचे समजल्यावर पार्वती गुप्त गुहेतून बाहेर येऊन त्वरेने मंदार पर्वतावर आली. पार्वतीने शंकरांचा सर्वत्र शोध घेतला, पण त्यांचा पत्ता लागला नाही त्यामुळे तिला रडू कोसळले. शंकराला व हिमालयाला हाका मारीत ती रानोमाळ भटकु लागली. अरण्यातील एका कोळ्याने तिचे रुदन ऐकले. तो त्वरेने हिमालयापाशी गेला व त्याला पार्वतीची अवस्था कथन केली.
तो वृतांत ऐकून हिमालय त्वरेने पार्वतीपाशी आला. त्याने तिचे प्रेमपूर्वक सांत्वन केले. त्याने तिला आपल्या घरी आणले. शंकरांचे कुशलवृत्त न समजल्यामुळे पार्वती दिवसेंदिवस अस्वस्थ होत होती. तिला धीर धरवेना. हे पाहून हिमालय म्हणाला, “पुत्री, तुझी मनोव्यथा मी जाणतो. तु गणपतीची आराधना कर म्हणजे तुझे मनोरथ लवकर पूर्ण होतील. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीच्या पार्थिव मूर्तीचे प्रसन्न मनाने व भक्तिभावाने केलेले पूजन विशेष फलदायी मानले जाते. दुसऱ्या दिवशी पार्थिव गणेश मूर्तीची उत्तर पूजा करावी. ती गणेशमूर्ती सजविलेल्या पालखीत अथवा रथात ठेवून मिरवणुकीने वाजत गाजत जलाशयापर्यंत न्यावी. तेथे तिचे विधिपूर्वक विसर्जन करावे. असे हे गणेश चतुर्थी व्रत पुण्यवर्धक, इष्ट फलदायक आणि विघ्ननाशक आहे. पार्वती, आता मी तुला गणेश चतुर्थीच्या महात्म्य विषयी एक प्राचीन कथा सांगतो, ती तु ऐक.”
एके दिवशी भगवान शंकर आपल्या परिवारासह कैलासावर बसले होते. त्यावेळी त्यांनी कार्तिकस्वामीला अनेक व्रताची माहिती सांगितली. शंकर म्हणाले, “कुमारा, गणेश चतुर्थीचे व्रत हे आचरणास सोपे, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि त्वरित कार्यसिद्धी करून देणारे म्हणून प्रसिद्ध आहे. याला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात.” हिमालयाने पार्वतीला गणेश व्रताची माहिती सांगितली. तेव्हा तिच्या मनात त्या व्रताविषयी अधिक जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली. हिमालय म्हणाला, “पार्वती, तुझ्याप्रमाणे कार्तिकेयला ही याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती, तेव्हा शंकरांनी त्याला कथारूपाने गणेश व्रताचे महत्त्व सांगितले. त्याच कथा मी तुला सांगणार आहे, त्या लक्षपूर्वक ऐक.” हिमालय पार्वतीला गणेश भक्तीच्या कथा सांगू लागला.
पूर्वे कर्दम नामक एक चक्रवती राजा होऊन गेला. तो महापराक्रमी, सर्व उत्तम गुणांनी युक्त व धर्मशील होता. एके दिवशी महर्षी भृगु त्याच्या भेटीस गेले होते. राजाने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. उच्चासनी बसवून त्यांची पूजा केली. मग त्याने विचारले, “हे तपोनिधी, मला कोणत्या पूर्व पुण्याईने या जन्मी एवढे विस्तृत राज्य व अपार ऐश्वर्य प्राप्त झाले ते सांगण्याची कृपा करावी.” भृगु ऋषी म्हणाले,”राजा, पूर्वजन्मी तु परिस्थितीने गांजून गेलेला गरीब क्षत्रिय होतास. याबद्दल तुझी पत्नी तुला नेहमीच दुषणे देत असत. शेवटी कंटाळून तू गृहत्याग केल्या. निबिड अरण्यात निघून गेलास. तेथे भटकत असताना तुझी आणि सौभरी ऋषींची भेट झाली. त्यांना पाहताच तुला भडभडून आले. त्यांना वंदन करून तू ओक्साबोक्शी रडू लागला. तुझी मनोव्यथा पाहून सौभरी ऋषींना दया आली. त्यांनी तुझी प्रेमाने विचारपूस केली आणि तुझे दैन्य दूर होण्यासाठी तुला गणेशवरद मंत्राचा जप करण्यास सांगितला.
हे पूर्ववृत्त कर्दम राजा अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. तो म्हणाला, “हे मूने! हा गणेश कोण? त्याचे महात्म्य काय?” भृगु म्हणाले, “गणेशाच्या विराट अस्तित्वाचा आणि अगाध लीला कर्तृत्वाचा कोणालाही थांग लागत नाही, त्यांच्याविषयी बोलताना वेद हि निशब्द झाले, तेथे मी काय सांगणार? असो. मी तुला पुढील वृतान्त सांगतो. सौभरींनी तुला त्यांच्या आश्रमात नेले. तेथे श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तु वरदगणेश व्रत केलेस. सौभरींनी उपदेशिलेल्या मंत्राचा एकाग्रतेने जप केलास. या आराधनेच्या पुण्य प्रभावाने तुला त्या जन्मात सुख, संपत्ती आणि वैभव प्राप्त झाले. इतकेच नव्हे तर या जन्मात तू चक्रवर्ती सम्राट बनलास हे लक्षात घे.”
स्वतःचे पूर्वजन्मवृत्त ऐकून कर्दम राजा थक्क झाला. त्याच्या मनात गणेश भक्ती उत्पन्न झाली. त्याने भृगुऋषींकडून गणेश चतुर्थी व्रताचा विधी नीट समजावून घेतला. गणेश मंत्राचा उपदेशहि घेतला. भृगु ऋषींच्या मार्गदर्शनानुसार गणेशाची आराधना करून त्याने इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त करून घेतले. मृत्यूनंतर त्याला गणेश लोकी उत्तम गती मिळाली.
हिमालयाने ही कथा सांगून पार्वतीला गणेश चतुर्थी व्रत करण्यास प्रेरित केले. त्यात त्याने तिला नल राजाची कथा सांगितली.
पूर्वी मगध देशात नल नावाचा राजा होऊन गेला. तो धर्माने राज्य करायचा. तो महाविद्वान होता. राजाची पत्नी दमयंती ही सुशील, सुंदर व पतिव्रता स्त्री होते. त्याचा प्रधान पद्महस्त हा हि उदारमतवादी, मुत्सदी, धोरणी आणि महाबुद्धिवान होता. एके दिवशीं राजा राज्यसभेत बसला होता. तेवढ्यात महातपस्वी गौतम ऋषी यांचे आगमन झाले. त्यांच्या दर्शनाने राजाला परमानंद झाला. त्याने पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांच्या सेवेने गौतम ऋषी अतिशय प्रसन्न झाले. तेव्हा नलाने त्यांची परवानगी घेऊन एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, “महाराज! आपण सर्वज्ञ आहात. या जन्मी मला उत्तम राजऐश्वर्य, सद्गुणी पत्नी,स्वामीनिष्ठ प्रधान, विनम्र सेवक याचा लाभ झाला आहे. हे कोणत्या पुण्य प्रभावाने साध्य झाले ते सांगण्याची कृपा करा.”
गौतम ऋषि म्हणाले, “ हे राजा ! पूर्वजन्मात तू एक गरीब क्षत्रिय वीर होतास. गौड देशातील पिंपळपुरात तुझे वास्तव्य असे. दारिद्रामुळे तुला सर्वत्र अपमान सहन करावा लागत असे. या उपेक्षेला कंटाळून तु निघून गेलास. विमनस्क अवस्थेत अरण्यातून हिंडत असताना तुझी आणि कौशिक ऋषींची गाठभेट झाली. तु त्यांना शरण गेलास आणि त्यांना आपली व्यथा सांगितलीस. दयाळू कौशिक ऋषींनी तुला वरद चतुर्थीचे गणेश व्रत करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तु परम श्रद्धेने त्या व्रताचे आचरण केलेस. त्यामुळे गणपतीच्या कृपेने तूला धन धान्य प्राप्त झाले. तु व तुझे कुटुंबीय सुखी झाले. त्याच व्रताच्या प्रभावाने तु या जन्मी चक्रवर्ती राजा झाला आहेस. गौतम ऋषींच्या मुखातून आपले पूर्ववृत्त जाणून घेऊन नल राजा धन्य धन्य झाला.
हिमालयाच्या मुखातून गणेश व्रत महात्म्यपर कथा ऐकून पार्वतीचे अंतकरण भक्तिभावाने भरून गेले. तिने अत्यंत श्रद्धेने गणेश व्रताचे आचरण केले. त्रिपुरासुराचा वध झाल्यावर भगवान शंकरांनी त्रैलोक्याची घडी बसवली. इंद्रादी देव आपापल्या अधिकारानुसार कार्यरत झाले. हे देवकार्य संपन्न झाल्यावर शंकरांना पार्वतीची प्रकर्षाने आठवण होऊ लागली. महानंदी वर बसून शंकर त्वरेने हिमालयाच्या घरी आले. त्या दिवशी गणेश चतुर्थीच होती. पार्वतीचे व्रताचरण त्या दिवशीच संपन्न झाले होते. भगवान शंकरांचे आगमन हि त्या व्रताची फलश्रुती च होती जणू! भगवान शंकराला पाहून पार्वतीला खूप आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत केले.काही काळ तेथे वास्तव्य करून शिव भवानी आपल्या गणपरीवारासह कैलासावर परतले.
श्रीगणेश*
भाग - ११.
सर्व देवांच्या विनंतीवरुन ओंकारस्वरुप गणेश सुवर्ण मयुरावर आरुढ होऊन सिंधु राक्षसाचा वध केला. पण त्याचा सेनापती कमलासूर याचे शीर धडावेगळे केले की, तो पुनः सजीव होत असे, शेवटी त्याचा शिरच्छेद केल्यावर देवांनी जीथे यज्ञयाग केला, त्या जागेवर शिर पडल्याबरोबर ओंकारस्वरुप गणेश त्या शिरावर आरुढ होऊन स्थीर बसले. त्यामुळे त्याचे शीर जमीनीत गाडल्या गेले. कमलासुरानं परत त्रास देऊ नये म्हणुन भूस्वानंदपुरी कायमचा निवास करण्याची गणेशाला विनंती सर्व देवांनी केल्यावर, अदृष्यरुपात राहीन असं वचन देऊन गणेश अंतर्धान पावले.
वामनभटजी व पत्नी पार्वतीबाई अस्वस्थ होते. त्यांना संतान हवा होता. वामनभटजींनी स्वतःला मयुरेश्वराच्या उपासनेत रात्रंदिवस वाहुन घेतले. त्यांनी तहान, भुक, झोप कशाची पर्वा न करतां कठोर तपश्चर्या सुरु ठेवली. शेवटी देवाला दया आली. स्वप्नात येऊन सांगीतले की, मी स्वतः तुझ्या घरी जन्म घेईन. पार्वतीबाईंना हे ऐकुन अत्यानंद झाला. माघ वद्य चतुर्थी शके १२८७ (इ. सं १३७५) रोजी वामनभटजींच्या पर्णकुटीत बालब्रम्ह प्रगट झालं. थाटामाटात बारसं करुन त्याचे नांव मोरया ठेवले.
एकदा मोरयाची प्रकृति खुपच बिघडली. अनेक औषधोपचार करुनही गुण येईना. अचानक पर्णकुटी बाहेर "अलख निरंजन" चा घोष झाला. दारी आलेल्या गोसाव्याचा आदरसत्कार करुनही मूलाला काहीच आराम पडत नसल्याचे सांगीतल्यावर, गोसाव्याने झोळीतील विभूती मोरयाच्या कपळाला लावुन, एक पताका, एक कफनी व एक टाळजोड देऊन तो गोसावी निघुन गेला. आणि अल्पावधीतच मोरयाची प्रकृती ठणठणीत झाली.
आठव्या वर्षी मोरयाचा व्रतबंंधन झाल्यावर कांहीवर्षे त्याने गुरुगृही अध्ययन केले. प्रतिबृहस्पती प्रमाणे त्याला बुध्दुमत्ता लाभल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत होते. नियमित व्यायामाने त्याचं शरीर प्रमाणबध्द झालं. मयूरेश्वराच्या नित्य भजनपुजनाने सौम्य तेज त्याच्या चेहर्यावर विलसत होते. मोरगावांत यात्रेनिमित्य हिंदुस्थानच्या विविध प्रांतातुन ये-जा होत असल्याने त्यांच्या संपर्कात राहुन हिंदी भाषेशी सलगी करुन घेतली.
मोरयाला ओढ लागली ज्ञानमुर्तीची....... तिच्या दर्शनासाठी अगदी व्याकुळ झाला. एका शिलाखंडावर बसुन सद्गुरुची कधी भेट होईल या विचारांत मग्न, अर्धवट डोळे मिटुन घेत आर्त स्वरांत एक हिंदी पद गाऊ लागला..... "रावल हमको विद्या दीजो। कानफाडा चेला कीजो।। परनंदन दोष न दीजो। गुरुमुख उपदेश कीजो।। हो रावल ।। गीतांची शेवटची ओळ संपते ना संपते तोच "सुंदर! अति सुंदर"!! या शब्दांनी मोरया भानावर आला. आपण कोण ? असे विचारल्यावर "नयनभारती" असं खणखणीत आवाजात उत्तर देऊन भगव्या वेशातील सन्यासी अदृष्य झाला.
एकदा मोरयाला काव्यस्फुरण झालं, तो नवीन गीताच्या ओळी गुणगुणत असतांना "कल्याणमस्तु" असा
आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने बघीतल्यावर त्याच्या जवळच साक्षात नयनभारती उभे होते, त्यांना नम्रपणे शिलाखंडावर विराजमान होण्यास सांगुन, अनुग्रह देण्याची विनंती केली. ते म्हणाले, पहिल्याच भेटीत तुझ्यावर अनुग्रह झाला. आतां तुला काय हवय! ते निःसंकोच मागुन घे!
मोरया म्हणाला मला आत्मज्ञान! इश्वरी साक्षात्कार आणि सद्गुरु प्रेम हवय! असं म्हणुन त्याने नयनभारतीचे चरण घट्ट धरले. तथास्तु! अस म्हणुन झोळीतील विभूती त्याच्या कपाळाला लावुन त्याला महाबोध केला.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
*श्रीगणेश*
भाग - १२.
अशा प्रकारे नयनभारती कडुन अनुग्रह घेतला. एकदा अचानक त्याला वाटले, आपल्या सद्गुरींची मानसपुजा करावी. मोरयाने डोळे मिटुन नयनभारतीची मूर्ती मनःचक्षूसमोर आणुन त्यांच्या ललाटी केशरकस्तुरीचा टिळा, मस्तकाला मृदु सुंगधी फुलांचा अभिषेक केला. पंचपक्वानांचा नैवद्य दाखवुन माझी सेवा गोड घ्या, असं म्हणत डोळे उघडल्यावर शिलाखंडावर स्निग्ध नजरेने पाहत त्याचे परमप्रिय सद्गुरु नयनभारती!
ते म्हणाले तुझी चित्तस्थैर्याची आणि गणेशदर्शनाची आकांक्षा पुर्ण होण्याकरितां थेऊरला जाऊन चिंतामणीची आराधना केल्यास तुझ्या चित्ताला स्थिरता येईल. पुर्वी ब्रम्हदेवाचं हरवलेलं चित्तस्थैर्य थेऊरलाच परत मिळालं. ते पुढे सांगु लागले...... ओंकारस्वरुप गणेशाने ब्रम्हदेवावर सृष्टी निर्मितीची जबाबदारी सोपवली. सृष्टीनिर्मितीचं कार्य करतां करतां ब्रम्हदेवाला 'ग' ची बाधा झाली. आपल्याशिवाय सर्वांचे अडते, ओंकारस्वरुप गणेशाचेही अडते अशी खुळी समजुत झाल्याने, अहंकार म्हणजे कार्यहानी व आत्मनाश, त्यामूळे सृष्टीनिर्मितीच्या कार्यात यश येईना.
काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपुंनी त्यांना ग्रस्त केले. एकामागून एक आलेल्या विघ्नांनी त्याचं चित्त अस्थीर झालं. देवर्षी नारद ब्रम्हलोकी आलेत, त्यांचि यथोचीत सत्कार ब्रम्हदेवाच्या सावित्री व भारती या भार्यांनी करुन आपल्या पतीचे चित्त कशामुळे स्थीर होईल? अशी विचारणा केली. नारदाने सांगीतले की, चिंतामणीची आराधना केल्यास चित्ताला स्थिरता व शांतता मिळेल.
एका सुमुहूर्तावर मुळामुठा नदीच्या पात्रात उभं राहुन ओंकारस्वरुप गणेशाच्या प्रसन्नतेसाठी उग्र अनुष्ठानं केली. पुर्वी ब्रम्हदेवाला ओंकारस्वरुप गणेशाकडून सिध्दी प्राप्त झाल्या होत्या, पण अहंकारामुळे त्या निघुन गेल्यात.
सिध्दीप्राप्तीसाठी आवश्यक पुण्यसंचय होताच गणेश प्रसन्न झालेत.ब्रम्हदेवाने ओंकारस्वरुप गणेशाची क्षमायाचना मागुन सृष्टीनिर्मितीचं कार्य यशस्वी होण्यासाठी अष्टसिध्दीची प्राप्ती व्हावी असा वर मागीतला, तथास्तु! म्हणुन ते अंतर्धान पावले. तत्काल आणिभा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य कामावसायिता या अष्टसिध्दी ब्रम्हदेवास मिळाल्यात.
ब्रम्हदेवाने सर्वांच्या उपस्थीतीत गणेशमूर्तीची स्थापना केली. त्यांच्या गळ्यात चिंतामणी रत्नांचा हार घालुन "चिंतामणी" असं नामकरण केलंं. ब्रम्हदेवाच्या चित्तास स्थिरता प्राप्त झाली म्हणून या ठीकाणास "स्थावर" असं नांव पडलं . पुढे त्याचाच अपभ्रंश होऊन "थेऊर" नांव रुढ झालं
मोरयाने गुरुदेवांना ( नयनभारती) प्रणाम करुन, आई-वडीलांची अनुज्ञा घेऊन, आणि मोरेश्वराचे दर्शन घेऊन थेऊरची वाट धरली.
मोरगांवची वाट एका डोंगरशिखराजवळुन जात होती. त्या डोंगराजवळ भुजंगाचं वास्तव्य होतं. मोरयाला माहित नसल्यामुळे तो त्याच वाटेने निघाला असतां, भुजंगाने मोरयाच्या पायाला कडकडुन दंश केला. मोरयाची गजानन चिंतनात एवढी टाळी लागलेली होती की, सर्पाने दंश केल्याची जाणीव सुध्दा त्याला झाली नाही. ही हकीगत थेऊर गावाला कळली. सारं थेऊर मोरयाच्या दर्शनाला लोटले. गजाननाची भक्ती, ज्ञान प्राप्त करुन तो मोरगांवला पोहोचला. पार्वतीबाईने त्याची दृष्ट काढली.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
*श्रीगणेश*
भाग - १३.
कांही दिवसांनी मोरयाच्या आई-वडीलांचे देहावसन झाले. या अफाट जगात मोरया एकटाच उरला. पण एकटा तरी कसं म्हणायचं? त्याच्यावर मायेची पाखर घालणारे दोघे होते. एक मयूरेश्वर व दुसरे त्याचे सदगुरु नयनभारती! आई-वडीलांच्या निधनाचे दुःख मोरयाने पचवले. इंद्रियांना जिंकुन "गोसावी" पदवी सार्थ केली.
मस्तकी जटाभार, ललाटी शेंदुराचा टिळा, दाढीमीशी, गळ्यात रुद्राक्षमाळा, सर्वांगावर फासलेले मस्म अशा मोरयाची मूर्ती बघीतली तरी लोकांचे दुःख दूर होई. दारी आलेल्या असंख्य लोकांचे दुःख मोरयाने दूर केले, परंतु सतत येणार्या भक्तांमुळे मयुरेश्वराच्या ध्यान धारनेला अवधीच मिळेनासा झाला.
एकदा मयुरेश्वराचे दर्शन घेऊन परत येत असतांना देवळाच्या ओवरीत शिवस्मृती जागविणारे नयनभारती दिसले, मोरयाने त्यांना भक्तीभावाने दंडवत घातला. नयनभारती मोरयाला म्हणाले, श्रीगणेश तत्वाचा सिध्दांत व अनुभव लोकांना समजेल अशा भाषेत ओवीबध्द ग्रंथाची निर्मिती कर! परंतु त्याआधी संपुर्ण भारतदेशाची भ्रमंती करुन समाजाच्या अवस्थेचे अवलोकन कर! श्रीगणेशस्थानांना, ज्योतिर्लिंगांना, देवीपीठांना, चारी धामांना, भेट देऊन विद्वानांशी, सत्पुरुषांशी चर्चा करुन विशाल दृष्टीकोणाने ग्रंथलेखनास प्रारंभ करुन ग्रंथाला "श्रीगणेश प्रबोधिका" हे नांव दे,
मोरयाची कित्येक वर्षे भारत भ्रमणांत गेली. फिरतां फिरतां अचानक थेऊरपासुन कांही अंतरावर किवजाई देवळाजवळ एक गुंफा दिसली. तिथेच मोरयाने "श्रीगणेशप्रबोधिक" ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. मोरगांवप्रमाणेच सिध्दटेक हे ठीकाण सुध्दा त्यांना विशेष आवडायचे.
त्या गुहेजवळच कांही अंतरावर पवारांचे घर होते. कधी कधी त्यांना मोरयाचे दर्शन घडायचे. एकदा पवारांनी ऊत्सुकतेपोटी गुहेत डोकावले तर त्यांना काय दिसले? मोरया ध्यानस्थ असुन त्यांच्या शेजारी मुंगुस व नाग खेळत होते. ते दृष्य पाहुन ते इतके भारावले की, त्यांनी मोरयाला गुरुस्थानी मानले. ते स्नानास गेले की, गुहा व परिवार पवार स्वच्छ करुन ठेवायचे, पाणी भरुन ठेवीत, कधी कधी फळं पण आणुन ठेवीत. एकदा पवार पती-पत्नी शेतात पिकाचे राखण करीत गुंतले होते. घरी त्यांची आंधळी मुलगी होती. मोरया नेमखे पवाराच्या घराजजवळ जाऊन, देवाला नैवद्य दाखवण्यासाठी विस्तव मागीतला. आंधळी मुलगी धडपडत दाराजवळ येऊन म्हणाली आई वडील शेतावर गेलेले आहेत, मला या फुटक्या डोळ्यांना चुल दिसत नाही. तरी आपण थोडावेळ आंत येऊन बसावे. आई आल्यावर ती अपल्याला देईल विस्तव!
मोरयाचे अंतःकरण गलबलुन आले, त्यांनी मयुरेश्वराचे व सदगुरुचे स्मरण करुन तीला म्हणाले, डोळे उघड पाहु! आणि काय आश्चर्य! तीने डोळे उघडल्याबरोबर तीला स्पष्टपणे सर्व दिसु लागले. तीला दृष्टी आली. मुलीला दृष्टी आल्याचे पाहुन तीच्या आईवडीलांना आनंदाचे भरते आले व मोरयावरची निष्ठा आणखी दृढ झाली. असे अनेक चमत्कार मोरयाने दाखवले.
मोरयाच्या कृपाकहाणया चिंचवड गांवात पोहोचल्या. गावांच भल व्हावं या उद्देशाने गावच्या कांही प्रमुख मंडळींनी त्यांच्या गुहेत जाऊन त्यांचे पाय धरले व चिंचवडला येण्याचे साकडं घातलं. त्यांच्या विनंतीस मान देऊन, चिंचवडच्या नदीतीराजवळ टवटवीत शम्मीवृक्षाजवळ येऊन बसले. लोकांनी त्या जागेवर गणेश मंदिर उभारले.. मूर्तीचं "कोठेरेश्वर" नांव ठेवुन स्थापना केली, परंतु त्यांना मोरगांवची ओढ असल्याने महिन्यातुन एकदा मोरगांवला जाण्याचा त्यांनी नियमच करुन टाकला.
एकदा त्यांमा मोरगांवला पोहोचायला उशीर झाल्यामुळे देवाचे दार बंद झाले, दाराला कुलुप! दर्शन न झाल्याने अस्वस्थ मनाने एका झाडाखाली ठाण मांडुन आर्त स्वरांत देवाची विनवणी करु लागले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
मंत्रपुष्प झाल्यावर म्हणण्यात येणाऱ्या प्रमुख गायत्री कोणत्या?*
*आरती झाल्यावर "यज्ञेन यज्ञमयजन्त" हा मंत्र "ॐ स्वस्ति साम्राज्यं" इत्यादि मंत्रपुष्पांजली झाल्यावर त्या त्या देवांच्या गायत्री म्हणण्याचा प्रघात आहे... त्यामध्ये प्रामुख्याने गणपती, सूर्य, देवी, शिव, विष्णु या पंचायतन देवता, ब्रह्माविष्णुमहेश तसेच महाकालीमहालक्ष्मीसरस्वती हे देवतात्रय, सद्गुरू दत्तात्रेय, नवग्रह, मत्स्यकूर्मादि दशावतार, हनुमान, नवनाथ इत्यादि देवता यांचा समावेश होतो. गायत्रीसंग्रहात कित्येक शत गायत्री सांगितलेल्या आहेत. त्यात नेहमी उपयोगी पडणाऱ्या काही निवडक गायत्री खाली दिलेल्या आहेत.....
*१. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ।।*
*२. भास्कराय विद्यहे मद्ध्युतीकराय धीमहि । तन्नो आदित्यः प्रचोदयात् ।।*
*३. दैव्यै ब्रह्मण्यै विद्यहे महाशक्त्यै च धीमहि । तन्नो देवी प्रचोदयात् ।।*
*४. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि । तन्नो रुद्रः प्रचोदयात् ।।*
*५. नारायणाय विद्यहे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णुः प्रचोदयात् ।।*
*६. वेदान्तनाथाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णुः प्रचोदत्*
*७. कात्यायन्यै विद्यते कन्याकुमार्यै धीमहि । तन्नो दुर्गा प्रचोदयात् ।।*
*८. महालक्ष्म्यै विद्यहे विष्णुपत्न्यै च धीमहि । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ।।*
*९. प्र णो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती । धौनामवित्र्यवतु ॥*
*१०. आंजनेयाय विद्यहे वायुपुत्राय धीमहि। तन्नो वीरः प्रचोदयात् ।।*
*११. नृसिंहाय विद्यहे वज्रदन्ताय धीमहि । तन्नो नृसिंहः प्रचोदयात् ।।*
*१२. कश्यपात्मजाय विद्यहे लघुरूपाय धीमहि । तन्नो वामनः प्रचोदयात् ।।*
*१३. जामदग्न्याय विद्यहे रेणुकात्मजाय धीमहि । तन्नः परशुरामः प्रचोदयात् ।।*
*१४. दशरथात्मजाय विद्यहे सीतावराय धीमहि । तन्नो रामचंद्रः प्रचोदयात् ।।*
*१५. दशरथात्मजाय विद्यहे उर्मिलेशाय धीमहि । तन्नो लक्ष्मणः प्रचोदयात् ।।*
*१६. जनकात्मजायै विद्यहे भूमिपुत्र्यै च धीमहि। तन्नो जानकी प्रचोदयात् ।।*
*१७. देवकीनन्दनाय विद्यहे वासुदेवाय धीमहि । तन्नः कृष्णः प्रचोदयात् ।।*
*१८. भीमकात्मजायै विद्यहे कृष्णकान्तायै धीमहि । तन्नो रुक्मिणी प्रचोदयात् ।।*
*१९. महाज्वालाय विद्यहे अग्निमन्नाय धीमहि । तन्नो वह्निः प्रचोदयात् ।।*
*२०. तत्पुरुषाय विद्महे स्वर्णपक्षाय धीमहि । तन्नो गरुडः प्रचोदयात् ।।*
*२१. दत्तात्रेयाय विद्यहे अवधूताय धीमहि । तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥*
*२२. परब्रह्मणे विद्यहे गुरुदेवाय धीमहि । तन्नो गुरुः प्रचोदयात् ।।*
*२३. हंसहंसाय विद्यहे परमहंसाय धीमहि । तन्नो हंसः प्रचोदयात् ॥*
*२४. भागीरथ्यै च विद्यहे विष्णुपद्यै च धीमहि। तन्नो गङ्गा प्रचोदयात् ।।*
*२५. भास्कराय विद्यहे दिवाकराय धीमहि। तन्नः सूर्यः प्रचोदयात् ।।*
*२६. क्षीरपुत्राय विद्यहे अमृतत्वाय धीमहि। तन्नश्चद्रः प्रचोदयात् ।।*
*२७. अङ्गारकाय विद्यहे भूमिपुत्राय धीमहि। तन्नो मङ्गलः प्रचोदयात् ।।*
*२८. सौम्यगुणोपेताय विद्महे अप्रतिमरूपाय धीमहि । तन्नो बुधः प्रचोदयात् ।।*
*२९. बृहस्पतये विद्महे देववंद्याय धीमहि । तन्नो गुरुः प्रचोदयात् ।।*
*३०. भार्गवाय च विद्महे दैत्यवंद्याय धीमहि । तन्नः शुक्रः प्रचोदयात् ।।*
*३१. कोणस्थाय च विद्महे सूर्यपुत्राय धीमहि । तन्नः शनैश्वरः प्रचोदयात् ।।*
*३२. सिंहिकात्मजाय विद्यहे महावीर्याय धीमहि । तन्नो राहुः प्रचोदयात् ।।*
*३३. तारकाग्रहमस्तकाय विद्यहे रौद्रात्मकाय धीमहि । तन्नः केतुः प्रचोदयात्*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
*🔸गणपतीचे अध्यात्मिक महत्व.🔸*
*वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |*
*निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||*
भाद्रपद शुध्द चतुर्थीला महासिध्दी विनायकी असे म्हणतात... त्यादिवशी ‘गणपती बाप्पा मोरया’ हा आवाज सर्वत्र ऐकायला मिळतो. ‘मोरया’ म्हणजे नमस्कार. त्या दृष्टीने पाहता, ‘गणपती बाप्पा मोरया’ चा अर्थ गणपती बाप्पाला नमस्कार असा होतो.....*
प्रत्येक शुभकार्यात सर्वप्रथम श्रीगणेशाचे पुजन केले जाते... गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा, पण अग्रपूजन हे गणपतीचेच झाले पाहीजे. पौराणिक कथा आहे की, अजाणता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला जो कोणी प्राणी प्रथम दिसेल त्याचे शिर आणण्यास सांगितले. पार्षदाला सर्वप्रथम हत्ती दिसतो व पार्षद हत्तीचे मस्तक घेऊन येतो. गणपतीच्या धडावर ते मस्तक ठेऊन गणपती बाप्पाला जिवंत केले जाते व आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गजानन, गणेश, गणराज अशा विविध नावाने ओळखला जाऊ लागतो.....*
गणपती बाप्पाला हत्तीचे मस्तक लावण्यात एक वैशिष्टय आहे... हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वांहून अधिक बुध्दीमान प्राणी आहे. गण-पती म्हणजे समुहाचा नेता होय. ह्याप्रमाणे नेता व तत्ववेत्ता ह्यांच्या जीवनात बुध्दीची तेजस्विता व समाजाला योग्य मार्गाने नेण्याची अभिलाषा असणे गरजेचे असते.....*
गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात... बारीक सुई देखिल जमिनीवरुन उचलण्याएवढी सूक्ष्म दृष्टी हत्तीची असते. मानवानेही स्वत:ची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवले पाहिजे. हत्तीचे लांब नाक (सोंड) दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते. नेता व तत्ववेत्ता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे, याचे ही सोंड सूचक आहे.....*
गणपतीला दोन सुळे असतात... एक पूर्ण व दुसरा अर्धा असतो. पूर्ण सुळा श्रध्देचा व अर्धा सुळा बुध्दीचा प्रतिक आहे.....*
*गणपती बाप्पाला चार हात असतात... एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक व चौथ्या हाताने गणपती बाप्पा आपणास आशीर्वाद देतात.....*
.गणपती बाप्पाला लंबोदर असे सुध्दा म्हणतात... सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वत:च्या विशाल उदरात साठवून ठेवल्या पाहिजेत ह्याची सूचना त्याचे मोठे पोट देते.....*
गणपतीचे पाय लहान असतात त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही... म्हणजेच कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये. जसा ससा व कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतो तसे हळूहळू पुढे जाणाऱ्याचे कार्य सुदृढ व सफल बनत जाते.....*
गणपतीचे वाहन उंदीर आहे. गणपतीचे वाहन इतके लहान असण्याचे कारण म्हणजे उंदीर हा त्याला घराघरात घेऊन जातो... महापुरुषाची साधने अशी लहान व नम्र असली पाहिजेत. जेणेकरुन ते घराघरात प्रवेश प्राप्त करु शकतील व सर्वांसाठी प्रिय बनू शकतील. गणपतीचे वाहन उंदीर हे मायेचेही प्रतिक आहे. उंदराप्रमाणे मायादेखिल मानवाला फुंकर मारुन चावत असते. फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेऊ शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. गणपतीचे वाहन उंदीर आपल्याला फार सूचक गोष्टी समजावते.....*
*गणपतीला दुर्वा फार आवडतात... लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही, असे गवत त्याने आपले मानले व त्याचे मूल्य वाढविले. नेता आणि तत्त्ववेत्ता ज्यांना काही महत्त्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करुन जीवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरे, दूर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही. रंगविरहीत, सुगंधविरहीत; ज्याची जगाच्या दृष्टिने काही किंमत नाही असे कर्मदेखिल प्रभुचरणावर प्रेमाने वाहिले तरी त्याला आवडते.....*
*गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल अधिक प्रिय आहे... लाल रंग हा क्रांतीचा सूचक आहे. शिवाय गणरायाला आपण तांदूळ वाहतो. तांदुळाला संस्कृतमध्ये ‘अक्षता’ म्हणतात. अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा; जो खंडीत नाही तर अखंड आहे. देवाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचे दर्शन अक्षता वाहण्यात आहे.....*
गणपतीला ‘वक्रतुंड’ म्हणतात... ऋध्दिसिध्दीपासून मुख फिरवून राहणाऱ्यालाच ऋध्दिसिध्दी मिळतात. वाकडे तिकडे चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड.....*
आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर आपल्या इंद्रियाचा एक गण आहे... आणि या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिध्दीस न्यायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की, मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे; ज्याच्यामुळे काही विघ्ने येऊ नये व कार्य सरळपणे पार पडावे.....*
गणेश-चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचे विसर्जन आपण अनंत चतुर्दशी-दिवशी करतो... जे सान्त आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात व सगुणाला निर्गुणात विलीन करतो.....*
अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकरें ॥*
*‘अ’ कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, ‘उ’कार म्हणजे विशाल पोट आणि ‘म’कार म्हणजे त्याचे मस्तक... अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती व मंगलमूर्ती गणेश, नेता व तत्त्ववेत्ता ह्यांचे आदर्श स्वरुप आहे.....*
*अर्चना जोगळे...*
*🔸गणपती बाप्पा🔸*
*पाहूणा तरी कसा म्हणू रे तुला गणेशा? तू तर आम्हा लोकांच्या मना- मनांत कायम घर करून आहेस. तूच तर करता करविता, आरंभ देवता, विघ्नहर्ता.*
*नव्याने कोणत्याही गोष्टीची सुरुवात करावयाची म्हटले की सर्वात पहिल्यांदा तुझीच मूर्ती डोळ्यापुढे ठेवून श्रीगणेशा होतो, आम्हाकडून. आनंदाच्या वेळीसुद्धा तुझ्याच पुढे साखर ठेवावी वाटते सर्वप्रथम. आणि संकटाच्या वेळीही तुझीच तर आठवण होते. तुझ्याच नावाचा घोष असतो मनात. तूच तर देतोस बळ अडचणींवर मात करण्यासाठी. म्हणूनच ना रे तूच सुखकर्ता आणि दुःखहर्ताही.*
गजानना, गेली दहा दिवस तू येऊन उपकृत केलयंस पाहुणा या नात्याने घराघरात. ते सुद्धा किती खोलवर रुजलाएस तू आमच्या मनात? हे तपासून बघण्यासाठीच ना? अगदी जवळून आमच्या सुखदुःखाशी, आनंदाशी एकरूप होण्या साठीच ना? घडेल तशी सेवा, घडेल तसा नेवेद्य स्वीकारण्यासाठीच ना?*
हे ओंकारा, एकाच वेळी घराघरांत प्रवेशता झालास, तेंव्हापासून नुसता उत्साह ओसंडून वाहत आहे आमचा. उत्सवी वातावरण निर्मिती करत, आम्हा सर्वांच्या आनंदाला उधाण आणले आहेस तू अगदी!*
मयूरेश्वरा, तुझ्या साक्षीने कितीतरी शुभारंभाच्या गोष्टी घडल्या. केवढी तरी खरेदी झाली. केवढ्या तरी व्यवहाराचा भागिदार बनलाएस आमचा तू! आणि कितीतरी जणांचं साकडं ऐकून घेतलंस तूच.*
फार त्रास दिला का रे अमेया, आम्ही तुला? तुझ्या निमित्ताने म्हणून लहान थोरांसाठी कितीतरी उपक्रम राबवले आम्ही. त्यांचा मनमुराद आनंद लुटला आम्हीच. आमच्यातील कलागुण प्रदर्शित करत विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले तुझ्याच संगतीने. त्यांना वाव मिळवून दिला तुझ्याच समोर. डिजे आणि गाण्यांच्या कर्णकर्कश आवाजाने उबग येऊन परतीचा जाण्याचा दिवस जवळ तर केला नाहीस ना तू विनायका? अशीही शंका डोकावतेय मनात.*
एकदंता, तू आलास तसा प्रत्येकाच्या आनंद व्यक्त करण्याच्या नाना तह्रां तू सहन केल्यास खऱ्या. तुझे कान सुपाएवढे म्हणून काहीही आणि कितीही ऐकून घेण्याची तुझी ही सवय. पण आम्हाला कधी कळणार रे, की हे नाहीच आहे योग्य ते? दे रे बाबा तूच आता अशा लोकांना सुबुद्धी जाता जाता. पण 'तुझ्यासाठी प्रसाद' या नावाखाली आमच्या जिभेचे चोचले भरपूर पुरवून घेतले आम्ही साऱ्यांनी भालचंद्रा.*
दरम्यानच्या काळात गौराई आल्या. त्यावेळी छोट्या बालकाप्रमाणे पुरवलेले तुझे लाड, आम्हाला आमचे बालपण आठवते करवून गेले. गौराईंना निरोप देताना, 'मी येईन काही दिवसात'. हा तू दिलेला शब्द पाळण्याची तुझी वेळ अगदी समीप येऊ घातली आहे.*
बाप्पा आज तुझ्या निरोपाचा दिवस. आम्हाला हुरहूर लावणारा, रिकामा रिकामा वाटवणारा आणि ' पुनःश्च कामाला लागा' हे सुचवणारा.*
*पण खरं सांगू लंबोदरा, तुझे रिकामे मखर आवरून ठेवताना राहून राहून आवंढे येतात रे या घशात. डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा घरातील प्रत्येक जण लपवण्याचा प्रयत्न करतो, पण लपतील तर शपथ! खरच दहा दिवस आमच्या सान्निध्यात येऊन आम्हाला सहवास घडवणारा, आमच्या सुखदुःखात एकरूप होणारा आणि आनंदात सोबत करणारा तो तूच एकमेव चिंतामणी. तूच मोरया नि तूच सिद्धेशा.*
हे वक्रतुंडा, तुझ्या येण्याने आलेले उत्साहाचे भरते तुझ्या निरोपाने रिते करून जातोएंस तू विघ्नेशा.*
*नावं कोणतीही घेतली तरी एकमेव मंगलमूर्ती आहेस तो तूच. हे कसे विसरू आम्ही गणनायका. आम्ही केवळ एवढेच म्हणू शकतो गजमुखा, की आमचा उद्याचा गजर हाच असणार आहे,*
*गणपती बाप्पा मोरया ।*
*मंगलमूर्ती मोरया।*
*पुढच्या वर्षी लवकर या।*
*बाप्पा लवकर या।*
*🔹लेखक: अज्ञात...🙏*
*🔸परिवर्तिनी एकादशी.🔸*
भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते... प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होते. परिवर्तिनी एकादशीला काही शुभ योग जुळून येत आहेत. परिवर्तिनी एकादशीचे व्रताचरण, पूजनविधी, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया.....*
आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मासाचा सात्विक काळ हा व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांसाठी विशेष करून ओळखला जातो... चातुर्मासाचा प्रारंभ आणि सांगता एकादशीच्या व्रताने केली जाते. चातुर्मासातील पहिल्या श्रावण महिन्यात व्रत-वैकल्यांची अगदी रेलचेल असते.....*
गोकुळाष्टमीनंतर सर्वांना वेध लागतात गणेश चतुर्थी म्हणजेच ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे... प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते.....*
आषाढी एकादशीपासून श्रीविष्णू शयन करतात, अशी मान्यता आहे... म्हणूनच याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. हा काळ कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला श्रीविष्णू शयनावस्थेत असताना कूस बदलतात. यामुळे विष्णूंच्या स्थानात बदल होतो, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.....*
यासाठी या एकादशीचे व्रत महत्त्वाचे मानले गेले आहे... परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्यप्राप्ती होते. या एकादशीला केलेल्या श्रीविष्णू पूजनामुळे मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले जाते.....*
*स्रोत: मराठी न्यूज, आंतरजाल...*
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय १७ वा*
दुसरा दिवस उजाडला. कानिफ गोपीचंदाला म्हणाला, "राजा, जालंदरनाथांना कोठे पुरले ती जागा दाखव." राजा म्हणाला "चला मी दाखवतो!" कानिफने राजाबरोबर आपल्या शिष्यांना पाठविले. ते ती जागा पाहून आले. कानिफ म्हणाला, "राजा, जालंदरांना बाहेर काढण्यापूर्वी तुझ्यासारखे दिसणारे पाच पुतळे करून आण. सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंडाचे पुतळे बनव." राजाने कारागिराकडून हुबेहूब पुतळे घडविले. ते पुतळे घेऊन राजासह कानिफ, जालंदराला जेथे पुरले होते त्या जागी आला. त्याने राजाला "एक कुदळ घेऊन त्या जागी जमिनीवर घाव घाल" असे सांगितले. पण त्या आधी सोन्याचा पुतळा त्या जागेच्या बरोबर वरती ठेवण्यास सांगितले. राजाने पहिला कुदळीचा घाव घातला तोच आतून जालंदराने रागाने ओरडून विचारले, "कोण खणतोय?" राजा म्हणाला, "मी गोपीचंद राजा खणतोय." ते शब्द राजाने काढले तोच कूपावर ठेवलेला होता तो सोन्याचा पुतळा जळून गेला. राजा घाबरला. मग कानिफाने रुप्याचा पुतळा ठेवून खणायला सांगितले. तेव्हा पण त्या पुतळ्यावर जालंदराच्या रागाचा परिणाम झाला व तो जळून गेला. मग तांबे, पितळे व लोखंड यांचे पुतळेही क्रमाने जळून गेले. कानिफाने राजाला खुणेने जवळ बोलावले व म्हटले "आता जरा वेळ थांब. मग पुन्हा कुदळीचा घाव घाल. कोण म्हणून विचारले की मी सांगेन." राजाने जमीन उकरण्यासाठी पुन्हा जरा वेळाने कुदळ उचलली.
च्या तेवढ्या वेळात कूपात जालंदर विचार करू लागला, 'चार-पाच वेळा मी संतापाने गोपीचंद राजाचे भस्म करण्याचा प्रयत्न केला पण तो मेला नाही हे मोठे नवल आहे. आता तो जर असला तर, समोर दिसताच तो चिरंजीव होईल.' इकडे 'चिरंजीव' मंत्राने भस्म भारून कानिफाने राजाच्या कपाळाला फासले, मग तो म्हणाला, "घाल घाव!" राजाने कुदळ मारली. आतून जालंदराने विचारले, "अजून कोण हा कुदळ मारतोय?" तेव्हा पटकन कानिफ म्हणाला, "गुरूजी, मी तुमचा बालक कानिफ. गोपीचंद राजाला घेऊन आलोय. त्याला जमीन उकरायला सांगितली आहे. गुरूजी तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे." ते शब्द ऐकताच जालंदराचा राग कोठच्या कोठे मावळला. त्यालाही कानिफाला भेटायची उत्कंठा लागली. "गोपीचंद राजा चिरंजीव होवो" असा आशीर्वाद त्याने दिला.
सेवकांना बोलावून भराभर जमीन खणण्याचे काम चालू झाले कुदळीचे घाव वज्रास्त्रावर पडले व खणखण असा आवाज आला. तेव्हा आतून जालंदराने इंद्राख योजून वखाख मोकळे केले व स्वतः जालंदर बाहेर आला. कानिफ व जालंदर अगदी प्रेमाने भेटले, गोपीचंदाने जालंदराला साष्टांग दंडवत घातले. तेव्हा जालंदर म्हणाला. "बाळा तू दैवयोगाने वाचला आहेस. आता तू सूर्यचंद्र असेपर्यंत अमर होशील!" जालंदराने मैनावतीचे, गोपीचंदाचे व कानिफाचे सांत्वन केले. मग तो गोपीचंदाला म्हणाला, "राजा! आता तू ठरव. तुला हे नश्वर राज्य व भोग हवेत की विरागी व्हायचे आहे? हे राज्य व ही संपत्ती क्षणिक आहेत. वैराग्यांचा मार्ग व भोगाचा मार्ग दोन्ही तुला मोकळे आहेत. तुझा तू विचार कर!"
गोपीचंद विचार करू लागला. "आज अकरा वर्षे खोल गर्तेत जालंदर जिवंत राहिला, यमाला याने नमविले आणि मला हा भस्म करून टाकणार होता. पाच पुतळे याच्या इच्छेमुळे जळाले. माझे राज्य वैभव म्हणजे याच्यापुढे चोथा, याने देऊ केलेले वैराग्याचे वैभव म्हणजे कायमची चिंता मिटवणारे आहे. गोपीचंद म्हणाला, "महाराजा आता मला इथले काहीच नको. आपण मला आपल्यासारखे करावे." जालंदर म्हणाला, "नीट विचार कर, ठाम बचन दे!" राजा म्हणाला, "अगदी निर्धाराने सांगतो, मला आपला म्हणावे. मी शरण आहे." तेव्हा जालंदराने आपला हात त्याच्या पाठीवर फिरवला व डोक्यावर ठेवला. मुखाने शाबासकी दिली. त्याचे शरीर डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. त्या कृपादृष्टीने राजा रोमांचित झाला. मग त्याच्या कानात जालंदराने मंत्रोच्चार केला. सर्व जग कसे नाशवंत आहे याची राजाला खात्री पटली. काया व दृश्य पदार्थ सर्व माया आहे असे दिसले. मोह नष्ट झाला. मन विनयशील झाले. मग जालंदराने वडाचा चीक लावून त्याच्या केसांच्या जटा वळल्या, त्याला कौपीन नेसविली. त्याच्या कानावर मुद्रा काढल्या. शैली, कंथा, भस्माची झोळी हाती दिली. शिंगी, कुबडी, भिक्षेची झोळी हाती दिली. त्याचे संपूर्ण परिवर्तन झाले. जालंदराचा हात हाती घेऊन तो प्रेमाने "नाथ नाथ!" असे म्हणू लागला.
ही बातमी अंतःपुरात गेली. त्यामुळे स्त्रीवर्गात एकच हाहाः कार उडाला. खिया शोक करू लागल्या. जालंदराने गोपीचंदाला प्रथम आपल्याच राज्यात, आपल्याच राजवाड्यासमोर, आपल्याच खियांकडे "माई, भिक्षा वाढा हो!" असे म्हणून भिक्षा मागण्यास सांगितले. वैराग्याची त्याची कसोटी घ्यायलाच हवी होती. ज्यांच्या मोहाने राजाने जालंदराला पुरले होते, त्यांच्या समोर बैरागी होऊन भिक्षा मागितली पाहिजे. गोपीचंदाने त्याचप्रमाणे भिक्षा मागण्यास प्रारंभ केला, तेव्हा मात्र त्याला पाहून खियांनी फारच दुःख केले. पाहाणारे लोक हवालदिल झाले पण, गोपीचंद अचल होता. गुरूची आज्ञा मानणे हेच त्याचे काम होते. लुमावंती आणि इतर खिया त्याच्या भोवती गोळा झाल्या. त्याला म्हणू लागल्या, "तुम्ही आमच्याजवळ संसार करणार नसलात तर आमचे काही म्हणणे नाही, पण आमच्या डोळ्यांसमोर तरी रहा. तुम्हाला एक पर्णकुटी बांधून देऊ. आम्हाला दर्शनसुख तरी मिळावे. आम्ही तुमची सेवा चाकरी करू.!" पण राजाचे त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. खिया सारख्या प्रश्न विचारीत होत्या व गोपीचंद योगातील गूढ उत्तरे देत होता. पुन्हा त्याने भिक्षा मागितली तर मिक्षा न घालता त्या रडत रडत जवळ येऊ लागल्या. तेवढ्यात मैनावतीने शिजवलेले अन्न आणले. संन्यासिनी आई व विरक्त राजा हाच भिक्षेकरी. अपूर्व दृश्य होते ते ! ती भिक्षा घेऊन गोपीचंद जालंदराकडे गेला व सर्व प्रकार सांगू लागला. तेवढ्यात मैनावती पण तिथे आली. तिनेही तेच सांगितले.
जालंदर व कानिफ, मैनावती व गोपीचंद यांनी त्यानंतर नाथपंथातील योगविद्येसंबंधी तीन दिवस खूप चर्चा केली. गोपीचंदाला जालंदराने सांगितले, "राजा, हा देश सोडून तू बद्रिकाश्रमाला जा. लोखंडाच्या काट्यांवर उभा राहून तेथे तू बारा वर्षे तप कर." राजा लगेच जायला निघाला. आपले सर्व राजवैभव सोडून गोपीचंद राजा खरोखरीच बद्रिकाश्रमाला जाणार हे ऐकताच सर्व प्रजाजन दुःखाने व्याकूळ होऊन त्याला निरोप देण्यासाठी हेलापट्टण नगराच्या सीमेपर्यंत गेले. लुमावंती राणीचा पुत्र मुक्तचंद याला मंत्र्यांनी त्यानंतर राजपद दिले. जालंदराने त्याचा राज्याभिषेक केला. राजाच्या सर्व सरदारांना व मंत्र्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रे व भूषणे देऊन त्यांचा गौरव केला. "मुक्तचंदाच्या आज्ञेत रहा" असे सर्व स्त्रियांना सांगितले. मैनावतीला गोपीचंदाप्रमाणेच मुक्तचंदाची काळजी घेण्यास सांगितले. नंतर जालंदर, कानिफ व त्याचे शेकडो शिष्य सहा महिने तेथे राहिले व त्याने राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.
*श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
देवांतक आणि नरांतक*
अंग देशात रौद्रकेतू आणि शारदा हे दाम्पत्य राहत होते. त्यांना दोन जुळे पुत्र झाले. ब्राह्मणाने आपल्या पुत्रांची देवांतक आणि नरांतक अशी नावे ठेवली. नारद ही जिज्ञासेने त्यांना पाहण्यासाठी आले. रौद्रकेतूने त्यांचे यथोचित स्वागत केले. आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या चरणावर घातले व म्हणाले, “हे ब्रह्मर्षी! माझ्या पुत्रांना आयुष्य व आरोग्य लाभावे, ते पराक्रमी व किर्तीमान व्हावेत म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या.” रौद्रकेतूच्या विनंतीवरून नारदाने त्यांच्या दोन्ही पुत्रांना नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. ‘त्यांची त्रिभुवनात कीर्ती होईल’ असा आशीर्वाद देऊन ते संचारार्थ निघून गेले.
विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर देवांतक आणि नरांतक पितृआज्ञेने अरण्यात गेले. तेथील एकांतात दृढ श्रद्धेने शिवमंत्राचा जप करू लागले. अशी बरीच वर्षे लोटली. त्यांची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी दोघांना दर्शन दिले. देवांतक व नरांतक म्हणाले, “हे देवाधिदेव, तुमच्या चरणी असलेली आमची भक्ती उत्तरोत्तर दृढ व्हावी, आम्हाला सुर, असुर, नर, यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर, सर्प किंवा पिशाचे यांच्याकडून दिवसा किंवा रात्री, शस्त्राने किंवा अस्त्राने मरण येऊ नये.” तेव्हा ‘तथास्तू’ असा आशीर्वाद देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले.
शिववरदानाने प्रबळ झालेल्या देवांतक आणि नरांतकांच्या मनात त्रिभुवनाच्या राज्याचा उपभोग घेण्याचे विचार थैमान घालू लागले. त्यांनी अमरावती ताब्यात घेऊन देवांतकाला इंद्रासनावर बसविले. इकडे नरांतकानेही पृथ्वी पादाक्रांत करण्याचा सपाटा चालविला. त्याने सज्जनांवर, ऋषीमुनीवर, ब्राह्मणांवर असंख्य अत्याचार केले. यज्ञकर्मे, देवपूजादी नित्यकर्मे बंद पाडली. सत्यलोक, विष्णूलोक, स्वर्गलोक, भूलोक व पाताळलोक आदी सर्व लोकांवर विजय संपादन करून ते दोन्ही बंधू एकमेकांच्या सहकार्याने निरंकुश सत्ता भोगू लागले.
*महोत्काटाचा जन्म*
कश्यप ऋषींनी गणपती कडून ‘मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा’ असे वरदान पूर्वीच मागून घेतले होते. आदिती ही त्यांची जेष्ठ पत्नी. कश्यप ऋषींनी आदितीला ओम गजाननाय नमः या मंत्राचे अनुष्ठान करण्यास सांगितले. पतीच्या आज्ञेने ती अरण्यात गेली. तेथे शंभर वर्ष एकोभावे आराधना केली. तिच्या विनंतीचा मान ठेवून गणपतीने सगुन साकार रूप धारण केले. त्याला पाहून आदीतीला परमानंद झाला. ती म्हणाली, “देवा तू माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावा, मला तुझे कोड कौतुक करता यावे अशी माझी फार इच्छा आहे.” तेव्हा “तथास्तु” असे अभिवचन देऊन गणपती अंतर्धान पावले.
यथावकाश आदिती गरोदर राहिली. प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या उदरी येत आहेत याचा तिला केवढा आनंद झाला. ती दिवसेंदिवस अधिकाधिक तेजस्वी दिसू लागली. एका सुमुहूर्तावर तिने अतिशय सुदृढ आणि सुंदर बालकास जन्म दिला. तेवढ्यात बालक रूपातील गणपती रडू लागले. त्याला तिने प्रेमाने हृदयाशी धरले. कश्यप ऋषींनी नूतन बालकाचे जातकादी कर्म केले. बाराव्या दिवशी त्याचे थाटामाटात बारसे केले. त्याचे *महोत्कट* नाव ठेवले.
*धुंधुरादी दैत्यांचा वध, चित्ररथ गंधर्वाचा उद्धार*
गजाननाने कश्यप ऋषींच्या घरी महोत्कट या नावाने अवतार घेतल्याचे वृत्त अंतर्ज्ञानाने ऋषींना तात्काळ समजले. देव आणि वशिष्ठ इ. थोर तपस्वी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या दर्शनास आले. राक्षसांनाही महोत्कटाचे जन्मरहस्य कळले होते. हा वैरी पुढे त्रासदायक ठरेल म्हणून ते आधीपासूनच त्याच्या नाशासाठी उद्युक्त झाले. एके दिवशी कश्यप ऋषी नदीवर गेले होते. आदिती होमाची सिद्धता करीत होती. महोत्कट पाळण्यात निजला होता. त्याच्या आजूबाजूला कोणी नाही हे पाहून विरजा नावाची एक राक्षसी स्त्री रुपाने तेथे आली. तिने महोत्कटास गिळून टाकले, तर काय आश्चर्य! तिच्या पोटातून असह्य कळा येऊ लागल्या. तिला चालताही येईना. ती जमिनीवर गडबडा लोळू लागली. महोत्कटने महिमा सिद्धीने आपला देह विशाल करून तिचे पोट फाडले आणि तो सुखरूप बाहेर आला. मोठी किंकाळी मारून ती गतप्राण झाली.
विरजेची किंकाळी ऐकून आदिती पाळण्यापाशी धावली. त्यात महोत्कट नाही हे पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. ती तशीच अंगणाकडे धावली. तेथे एक महाकाय राक्षशीण रक्तबंबाळ होऊन मरून पडलेली दिसली. महोत्कट रक्ताने माखला होता. तिने त्याला गरम पाण्याने अंघोळ घातली. विरजा राक्षसीण दृष्ट हेतूने आलेली होती, पण गणपतीच्या हातून मरण आल्यामुळे तिला मुक्ती मिळाली. कश्यप ऋषि घरी आले. आदीतीने त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी आपल्या पुत्रावर शांती संस्कार केले आणि त्याच्या रक्षणासाठी गणपतीची प्रार्थना केली.
विरजेच्या निधनाचे वृत्त कळताच उद्धत आणि धुंधुर हे दोन दैत्य कश्यप ऋषींच्या आश्रमात आले. ते पोपटांच्या रूपाने बागडू लागले. महोत्कटाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. ते पाहून दोन्ही पोपट धिटाईने त्यांच्यापाशी गेले. लहानग्या महोत्कटाने झडप घालून दोघांनाही पकडले. तेव्हा त्याने रागाने दोघांनाही जमिनीवर आपटून ठार केले. मरताना ते मूळ स्वरूपात प्रकट झाले होते. आपल्या पुत्राचा तो पराक्रम पाहून कश्यप ऋषी आणि आदितीला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला.
या घटनेनंतर ची चार वर्ष सुरळीत गेले. एकदा सोमवती अमावस्यानिमित्त आदिती महोत्कटाला घेऊन एका सरोवरावर स्नानासाठी गेली होती. त्याला काठावर बसून ती पाण्यात प्रवेशली. तिचे लक्ष नाही आहे असे पाहून तोही पाण्यात उतरला. तेवढ्यात एका मगरीने त्याचा पाय धरला आणि त्याला आत मध्ये ओढत घेऊन जाऊ लागली. महोत्कटाने ओरडण्यास सुरुवात केली. तेव्हा महोत्कटाने प्रयत्नाची शर्थ करुन आपला पाय सोडून घेतला आणि त्या मगराला उंच भिरकावले. जमिनीवरच आढळताच तो महाकाय जलचर गतप्राण झाला. त्याच्या देहातून एक सुंदर गंधर्व प्रकट झाला. त्याने महोत्कटाला वंदन केले व म्हणाला, “देवा, आज तुमच्यामुळे माझा उद्धार झाला. मी चित्ररथ नामक गंधर्व आहे. भृगु ऋषींच्या स्वागतात काही उणिवा राहिल्या म्हणून ते संतापले. त्यांनी ‘तू मगर होशील’ असा मला शाप दिला. मी त्यांची क्षमा मागितली. मला उ:शाप द्या अशी विनंती केली. ते म्हणाले, “कालांतराने गजानन कश्यपपुत्र महोत्कट म्हणून अवतार घेईल. तो तुझा उद्धार करील.” हे त्यांचे वचन आज खरे झाले आहे. सर्वांना वंदन करून चित्ररथ आकाशमार्गाने गंधर्वलोकी निघून गेला.
श्री गणेश पुराण कथा (ब)*
*कश्यप आणि आदितीला ब्रम्हांड दर्शन*
महोत्कटाचे चरित्र मोठे विलक्षण आहे. एकदा हाहा, हूहू आणि तुंबरु हे तीन गंधर्व वीणेवर भगवन्नामस्मरण करीत कैलासाकडे निघाले होते. वाटेत कश्यप ऋषींचा आश्रम दिसला. कश्यप आणि आदितीने त्यांचे स्वागत केले. गंधर्वांनी स्नान केले. मग शिवपंचायतनाची पूजा करून ते ध्यानस्थ बसले. तेवढ्यात महोत्कट खेळत खेळत तेथे आला. त्याने पंचायतनात मांडलेल्या देवी, शंकर, विष्णू, गणपती आणि सूर्य यांच्या मूर्ती दूर भिरकावून दिल्या. त्यांनी कश्यप ऋषींकडे तक्रार केली. त्यांनी महोत्कटाला विचारले. तेव्हा तो भोकाड पसरून रडू लागला. त्यावेळी अदितीचे त्याच्या पसरलेल्या तोंडाकडे लक्ष गेले.
त्यामध्ये तिला स्वर्ग, मृत्यु, व पाताळासह चौदा भुवने आणि अनेक प्रकारच्या सृष्टीने भरलेले विराट ब्रम्हांड दिसले. ते पाहून तिला भोवळ आली. कश्यप ऋषींना ही त्या विश्वरूपाचे दर्शन झाले. त्यांनी त्याचे महात्म्य ओळखले. हा परमात्मा आहे याची त्यांना खूण पटली. कश्यप ऋषींनी महोत्कटाकडे हेतूपूर्वक पाहिले, तर काय आश्चर्य! पूजास्थानी पंचायतन देवता त्यांच्या सर्व वैभवासह विराजमान दिसल्या. कश्यप पुत्राचे ते लीला कर्तुत्व पाहून त्या तिन्ही गंधर्वांनी त्याला आदराने वंदन केले.
महोत्कट पाच वर्षाचा झाला. कश्यपांनी त्याचे चौलकर्म व मौजीबंधन करण्याचे ठरविले. होम हवनादी विधी संपन्न झाले. मुहूर्त समयी अंतरपाट धरण्यात आला. जमलेली मंडळी आशीर्वादाच्या स्वरूपात अक्षता टाकू लागली. त्याप्रसंगी विघात, पिंगाक्ष, विशाल, पिंगल आणि चपल हे पाच दैत्य वेशांतर करून तेथे आले होते. महोत्कटाचा घात करण्यासाठी अक्षतांच्या रूपाने त्यांनी अस्त्रेच टाकली. ते कपट महोत्कटाला तात्काळ समजले. त्यानेही अक्षरांवर पाच अस्त्रे अभिमंत्रित करून त्यांच्या दिशेने भिरकावल्या. त्या अस्त्राने त्या दृष्टांचा मंडपातच निकाल लावला. ते पाहून आनंदित झालेल्या देवतांनी व ऋषी जणांनी पुष्पवृष्टी करून महोत्कटाचा जयजयकार केला. राक्षसांची प्रेते दूर नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. मंडप स्थान स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर उर्वरित विधी सुरू झाले. कश्यप ऋषींनी महोत्कटाला गायत्री मंत्रोपदेश केला, आदितीने त्याला कौतुकाने भिक्षा घातली.
*धूम्राक्ष,जघन,मन्यु,दंतुर आदी दैत्यांचा वध*
कश्यप ऋषि पूर्वीपासूनच काशीराजाकडील धर्मकार्याचे पौरोहित्य करीत होते. एके दिवशी तो राजा ऋषींकडे आला व म्हणाला, “मुनिवर्य, माझ्या मुलाचा विवाह ठरला आहे. या मंगल कार्यात तुम्हीच पौरोहित्य करावे.” कश्यप ऋषी म्हणाले, “राजा, या चातुर्मासात मी यज्ञ करणार आहे. तसा संकल्प आधीच केलेला असल्यामुळे मी स्थान सोडून येऊ शकत नाही. या कार्यात तू माझ्या पुत्राचे सहाय्य घे.” राजाने त्याचे म्हणणे मान्य केले.
सात-आठ वर्षाच्या महोत्कटाला बरोबर घेऊन तो आपल्या सैन्यासह स्वस्थानी निघाला. वाटेमध्ये एक अरण्य होते. त्या अरण्यात धूम्राक्ष नावाचा एक दैत्य झाडाला उलटा टांगुन घेऊन दहा हजार वर्षांपासून तपश्चर्या करीत होता. नरांतकाचा तो चुलत बंधू धूम्रसेवन करून राहत असे. काशीचा राजा त्या अरण्यातून मार्गक्रमण करू लागला. योगायोगाने त्याच वेळी धुम्राक्षाची तपश्चर्या फळास आली. त्याच्यावर प्रसन्न होऊन सूर्याने एक दैदिप्यमान अस्त्र पाठवले. त्या अस्त्राकडे महोत्कटाचे लक्ष गेले. हे अस्त्र धुम्राक्षाच्या हाती लागले तर तो त्रिभुवनाला त्राही त्राही करेल याची त्याला कल्पना आली. त्याने उड्डाण करून ते अस्त्र पकडले आणि त्याच अस्त्राने धूम्राक्षाचा वध केला.
त्याची किंकाळी ऐकून त्या दैत्याचे जघन आणि मन्यु हे दोन पुत्र तेथे धावत आले. ते राजावर धावून गेले. ते ऐकून काशी राजाच्या सर्वांगाला भीतीने घाम फुटला. घशाला कोरड पडली. जघन आणि मन्यु महोत्कटाकडे क्रोधावेशाने बघू लागले. शस्त्र उगारून त्याच्या अंगावर धावले. त्यांच्या पवित्रा पाहून महोत्कटाने मोठी गर्जना केली. मग त्याने इतक्या जोराने श्वास सोडला की त्याच्या झोताने ते दोघे बंधू आकाशात उंच भिरकावले गेले. ते नरांतकाच्या नगरातील एका घरावर पडून जागीच ठार झाले. ते वर्तमान ऐकून नरांतक अतिशय संतापला.
इकडे महोत्कटाला बरोबर घेउन काशीराजा आपल्या नगरात प्रवेशला. लोकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. पुढे नगरातील मुलांनी महोत्कटासमवेत खेळण्यासाठी त्याला खूप आग्रह केला. त्याला त्यांचे मन मोडवेना. त्या बालकांमध्ये दंतुर आणि विंधर हे दोन दैत्य रूप पालटून आले होते. खेळता खेळता त्या दोघांनी महोत्कटास दोन्ही बाजूनी आवळून ठार करण्याचा जोरदार प्रयत्न केला. तेव्हा त्याने स्वतःला सोडवून त्या दुष्टांना इतके घट्ट आवळले की त्यांच्या हाडाचा चक्काचूर झाला. गतप्राण होऊन दोघे खाली कोसळले. त्यांची महाकाय कलेवरे पाहून लोकांच्या छातीत धडकीच भरली.
त्यावेळी पतंग आणि विद्युत हे दोन दैत्य वायू रुपाने महोत्कटाचा घात करण्यास आले. त्याने त्या दोन्ही राक्षसांना गाठले. त्यांचे गळे दाबून त्यांना एकेका मुष्टीनेच गारद केले. तेवढ्यात एक दैत्य मोठ्या दगडाच्या रूपाने रस्ता अडवून बसला. लोक संभ्रमात पडले. महोत्कटाने त्याला ओळखले. आपल्या हातातील अंकुशाने त्या दगडाच्या ठिकऱ्या उडवल्या. तो राक्षस छिन्नभिन्न होऊन विखरून पडला. राजधानीत प्रवेश केल्यापासून महोत्कटाने अशाप्रकारे अनेक दैत्यांना यमलोकी धाडले. हे सर्व लोकांच्या समोर घडले त्यामुळे तो गजाननाचा अवतार आहे अशी लोकांची खात्री झाली. त्यांनी जयजयकाराच्या गर्जनेत त्याला राजप्रासादात नेले. राजाने त्याची पूजा केली. त्याची उत्तम व्यवस्था ठेवली.
दुसऱ्या दिवशी धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण राजाला भेटण्यासाठी आला. राजाने महोत्कटाला बोलावून घेतले. तो म्हणाला, “बाळा, मी तुझ्या पित्याचा परममित्र आहे. तू माझ्या घरी आलास तर मला समाधान वाटेल.” त्याची विनम्रता आणि भक्तिभाव पाहून त्याला संतोष वाटला. काशीराजाची संमती घेऊन तो त्यांच्यासमवेत निघाला. मार्गामध्ये कामासूर आणि क्रोधासूर हे दोन दैत्य रूप पालटून एकमेकांशी भांडत होते. महोत्कटाला त्यांचा राग आला. त्याने दोघांचेही पाय धरले, त्यांना गरागरा फिरवले आणि दणकन खाली आपटले. मस्तकांचा चुराडा होऊन त्यांनी क्षणार्धातच श्वास सोडला. मरताना ते राक्षसी देहात प्रकट झाले होते. त्यांना ओलांडून महोत्कट पुढे निघाला.
समोरून एक मदोन्मत्त्त हत्ती प्रचंड चीत्कार करीत त्याच्या अंगावर धावून आला. महोत्कटाने उंच उडी घेऊन त्या हत्तीच्या गंडस्थळ गाठले आणि सर्व सामर्थ्यानिशी आपल्या हातातील अंकुश त्याच्या मस्तकात घुसवला. त्याच्या विशाल देह निष्प्राण होऊन खाली कोसळला. त्याचे एक बलाढ्य राक्षसात रूपांतर झाले होते. हे सर्व पाहून धर्मदत्त अगदी थक्क झाला. त्याने महोत्कटाला आपल्या घरी नेले.
जृंभा हि धूम्राक्ष दैत्याची पत्नी. ती धर्मदत्ताच्या घरोबातल्या एका स्त्रीचे रूप घेऊन तेथे उपस्थित होती. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर सुगंधी तेल घेऊन ती महोत्कटापाशी आली. ते तेल नसून विष होते. महोत्कटाने तिचे कपट ओळखले होते, पण तो काहीच बोलला नाही. मुकाट्याने तिच्या पुढ्यात बसला व तेल लावून घेऊ लागला. तेव्हा ते विष त्याच्या अंगात न भिनता तिच्याच अंगात भिनू लागले. तो दाह असह्य होऊन ती जमिनीवर गडबडा लोळू लागली. महोत्कटाने जवळच असलेला नारळ तिच्या डोक्यात आपटला. ती रक्तबंबाळ होऊन मरून पडली. ती राक्षसीण आहे हे कळताच धर्मदत्ताचे सर्वांग शहारले. तो भीतीने घामाघूम झाला.
आतापर्यंत घडलेला सर्व प्रकार पाहून आपल्या पुत्राचा विवाह विनाविघ्न संपन्न होईल की नाही याविषयी काशीराजाच्या मनात चिंता उत्पन्न झाली. त्याच रात्री आणखी एक संकट उद्भवले. नरांतकाचे व्याघ्रमुख, ज्वालामुख आणि दारूण हे तीन दैत्य नगरात प्रवेशले. महोत्कटाला घेऊन राजा त्वरेने बाहेर पडला. नागरिकांचे हाल पाहून त्याला मनस्वी दुःख झाले. तोच व्याघ्रमुख समोरून आला. त्याने महोत्कटाला गिळून टाकले. तेव्हा महोत्कटाने विशाल रूप घेऊन त्याचे पोट फाडले. मग त्याने अग्नी आणि वायूचे रूपाने उत्पात घडविणाऱ्या अन्य दोन्ही दैत्यानाही गिळून टाकले. हे महान सामर्थ्य पाहून लोकांनी त्याचा जयजयकार केला.
*ॐ श्री गणेशाय नम: |*
*ॐ नमो जी श्रीगणेशा । आद्य वन्द्य तु सुरवरेश्वरा । ॐकार_शुण्डा, शूर्प_कर्णा । ब्रह्माण्ड_उदरा, लम्बोदरा... (१)*
*उत्पत्ति, स्थिति, लय कधी ? कसा ?। का ? कुणाचा ? या गणितांच्या । 'समीकरण'रूपी तव 'पाशा'। हस्ती धरुनी क्रीडसी मोदे... (२)*
*तव सु'स्वरूप', लीलादिका । वर्णावे ऐशी मम इच्छा । पूर्ण करावी हीच प्रार्थना । तव चरणी मी करीतसे ...(३)*
*तव लीला_'अवतार' कथा । व्रते, पूजा विधि विधाना । गणेश, मुद्गल पुराणी वर्णिल्या । व्यासावतारी नारायणाने... (४)*
*त्यातील काही वेचक माहिती । 'मराठी' भाषेत करण्यास 'उक्ति' । द्यावी मजला बौद्धिक शक्ति । ऐशी विनवणी तव चरणी ...(५)*
*'कृत'युगी अदिति-कश्यप पुत्र । अवतरलास तु 'महोत्कट' । मारावयास नरांतक देवांतक । लीला विनोदे मांडिली... (६)*
*'त्रेता' युगी तु गिरिजात्मज । नामे 'गुणेश', 'मयूरेश्वर' । मारिलास 'सिंधु' दैत्येश्वर । भक्त संरक्षणाप्रीत्यर्थ ... (७)*
*'द्वापर' युगी ब्रह्मदेवे । देता जांभई 'सिन्दूर' उद्भवे । वरेण्य पुत्र 'गजानन' रूपे । चिरडून 'सिन्दूर'_वर्ण तव झाला ...(८)*
*'कलि' युगी तु युगांत समयी । 'धर्म' पुन: प्रस्थापण्यासी। 'धुम्रकेतु' नामावतारी। प्रगट होशील भविष्यात ...(९)*
*अवस्थेतली चतुर्थावस्था । जिला नाम 'तुरीया' वा 'तुर्या' । तीच स्वानंदे 'सहज' साध्य होता । तव सालोक्य मुक्तिचा लाभ... (१०)*
*चारही पुरुषार्थाञ्चा दाता । चारही सं_कष्टांचा हर्ता । विघ्न कर्ता धर्ता हर्ता । अनाकलनीय या तुझ्या लीला ...(११)*
*तुझे चतुर्थी तिथी_व्रत । शुक्ल, कृष्ण दोनही पक्षांत । 'विनायकी', 'संकष्टी' नामे प्रसिद्ध । प्रिय सर्व गाणेश भक्तासी... (१२)*
*शुक्ल पक्षात चंद्रोदय । दिवसा सूर्योदयानंतर । मेळविण्यास चारही पुरुषार्थ । ज्ञान_सूर्य उजेडात मानसीच्या ...(१३)*
*कृष्ण पक्षात चंद्रोदय । रात्री सूर्यास्ता नंतर । रात्री अंधार अज्ञान तिमिर । त्यावरी सं_कष्टांचा मारा ...(१४)*
*जेथे मानवी शक्ती, युक्ती । अपुरी पडे ऐशिया समयी । गणेशा तुझी कृपा दैवी । मागावया संकष्टी व्रताचरण... (१५)*
*गणेशा तुझी आद्य वंदना । मान्य सर्व वैदिक जना । शैव, शाक्त, सौर, वैष्णवा । 'गाणेश' तर तुझेच अनुयायी... (१६)*
*अवैदिक बौद्ध, जैन, शीख । वीरशैवादिक पंथ अनंत । तेही तुला मानिती अत्यंत । सर्वमान्य तु जगद्वंद्या... (१७)*
*वार_व्रत तव मंगळवारी । भौम, भूमिपुत्र ग्रहाचे वारी । येता 'चतुर्थी' त्याच वारी । 'अंगारकी' योग तव वरदाने... (१८)*
*ऐशी 'अंगारकी' विनायकी । तैशीच 'अंगारकी' "संकष्ट_चतुर्थी" । जे जे भक्तीने आचरिती । 'पुण्यार्जन' त्यांस अधिक होई ...(१८)*
*व्रताचरणार्थ 'उपवास'। पूजा, अर्चना करुनी 'विशेष' । गाती जे तुझी स्तोत्रे सतत । त्यांवरी 'प्रसन्न' होसी तु... (१९)*
*अदिती, पार्वती, लक्ष्मी देवीन्नी । ऐसेच तुजसी सुप्रसन्न करुनी । 'वरदानार्थ' तव मातृत्व मागुनी । अवतार तुजसी घडविले... (२०)*
*अदितीपुत्र 'महोत्कट'। पार्वतीपुत्र 'गिरिजात्मज' । लक्ष्मीपुत्र 'ढुंढिराज'। अवतार तुझे ऐसे नाना ...(२१)*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸रूप श्रीगणेशाचे.🔸*
*गणपती हे अति प्राचीन दैवत आहे, वैदिक देव आहे, आदिदेव आहे. कोणत्याही शुभकार्यारंभी अग्रपूजेचा प्रथम मान गणपतीलाच मिळाला आहे. श्रीगणेश हा सुख देणारा, दु:ख हरण करणारा, दुष्टांना शासन करणारा आणि भक्तांना आनंद देणारा, कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान असलेला देव आहे.*
*दरवर्षी कोट्यवधी लोक अष्टविनायकांचं, साडेतीन पिठांचं आणि पुराणोक्त गणेशाचं मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. त्या गणरायांच्या २१ नाव, रूप, त्याला आवडणारी फुलं, फळं, नैवेद्य आदींविषयी...*
*१. मयुरेश्वर-मोरगाव, पुणे.
*२. सिद्धिविनायक-सिद्धटेक, अहमदनगर.*
*३. बल्लाळेश्वर-पाली, रायगड.*
*४. वरद विनायक-महाड, रायगड.*
*५. चिंतामणी-थेऊर, पुणे.*
*६. गिरिजात्मक-लेण्यादी, पुणे.*
*७. विघ्नेश्वर-ओझर, पुणे.*
*८. श्री महागणपती-रांजणगाव, पुणे*
*९. मंगलमूर्ती, चिंचवड, पुणे.*
*१०. कसबा गणपती-पुणे.*
*११. सिद्धिविनायक- सारसबाग, पुणे.*
*१२. गणेश- कढाव, रायगड.*
*१३. टिटवाळा-महागणती- ठाणे.*
*१४. पुळ्याचा गणपती- रत्नागिरी.*
*१५. हेदवीचा दशभुज-रत्नागिरी.*
*१६. वक्रतुंड- आवास, रायगड.*
*१७. मोदकेश्वर- नाशिक.*
*१८. मुद्गल गणेश-परभणी.*
*१९. चिंतामणी-कळंब, यवतमाळ,*
*२०. श्रीसिद्धिविनायक- प्रभादेवी.*
*२१. श्री सिद्धिविनायक-सीताबडीर्, नागपूर.*
*देशातील प्रसिद्ध २१ गणपती...*
*ॐकार गणेश-प्रयाग.* *महोत्कट- काश्मीर.*
*विघ्नराज- आंध्र प्रदेश.*
*श्वेता गणेश- केरळ.*
*गणेशजी- बंगाल.*
*मंगलमूर्ती -मध्य प्रदेश.*
*ढुंढीराज- काशी.*
*बदरी गणेश-हिमाचल.*
*गणेश बर्फ लिंग-हिमाचल.*
*नरक विमोचन गणेश- आसाम,*
*ब्रह्मागणेश- बिहार.*
*सीतामढीचा गणेश- बिहार.*
*षड्भूज गणेश- पंजाब.*
*बली गणपती- राजस्थान.*
*दुर्गकूट गणेश- गुजराथ.*
*पंचमुखी गणेश- मध्य प्रदेश.*
*खांडोळ्याचा गणेश- गोवरा.* *गोकर्णाचा गणेश- कर्नाटक.* *भद्राचलम गणेश- आंध्र.*
*कावेरीकांत विनायक- चेन्नई.*
*कल्पगणपती- ओरिसा.*
*जगातील प्रसिद्ध २१ गणपती.*
*पंचगणपती, नृत्यगणपती, सोळा हातांचा गणपती आणि हेरंब गणेश-नेपाळ.*
*गणेश-कंबोडिया.*
*द्वारपाल गणेश- तिबेट.*
*महापियेन गणेश-ब्रह्मादेश.*
*गुढविद्या गणेश-चीन.* *गणेशमूतीर्ती -मेक्सिको.* *गणेश-तुर्कस्तान.*
*गणेश- श्रीलंका.*
*गणपती-बानिर्ओ.* *गणेश-अफगाणिस्तान.* *गणपती- बाली बेट.*
*बोरीचा गणपती -इण्डोनेशिया.* *गणेश-जावा.*
*लेखक गणेश- सयाम.*
*गुरू गणेश- कंबोडिया.*
*गणपती- रोम, इटली.*
*श्री गणेश- जपान.*
*योद्धा गणेश- इराण.*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸गणपतीला आवडणाऱ्या २१ वस्तू.🔸*
*१) मोदक, २) नारळ, ३) चंदकोर, ४) ओम् ५) खेटव, ६) स्वस्तिक, ७) एकदंत, ८) विडासुपारी, ९) दूर्वा, १०) नागबंद, ११) मुद्गर, १२) शूल, १३) खट्वाग, १४) परशु, १५) पाश, १६) मोर, १७) अनंत फूल, १८) अंकुश, १९) कमळ, २०) उंदीर, २१) केवडा.....*
*गणपतीची २१ नावं...*
*१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष. ४ गजवक्र, ५. लंबोदर, ६. विकट, ७. विघ्नराजेंद, ८. धुम्रवर्ण, ९. भालचंद, १०. विनायक, ११. गणपती, १२. गजानन, १३. ओंकार, १४. मयुरेश्वर, १५. धुम्रकेत, १६. महोदर, १७. विघ्नराज, १८. ब्रह्माणस्पती, १९, जगदीश, २०. श्रीगणेश, २१. अदिदेव.....*
*पूजेसाठी २१ पानं...*
*दुर्वा, मधुमालती, बोर, माका, बेल, धोतरा, आघाडा, तुळस, डोलरी, कण्हेरी, शमी, अर्जुन, रुई, विष्णुकांत, जाई, डाळींब, देवदार, केवडा, मारवा, पिंपळ, अगस्ती.....*
*२१ फुलं...*
*जास्वंदी, पांढरं कमळ, तांबडं कमळ, जाई, मधुमालती, सोनचाफा, केवडा, बकुळ, उंडी, सुपारी, नागकेशर, मोगरा, धोतरा, कण्हेरी, प्राजक्त, चवई, नांदुरकी, गोविंद, मोहोर, शतपत्र.....*
*२१ पुराणं...*
*गणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रह्मावैवर्त पुराण, अग्नि पुराण, पद्म पुराण, पद्म पुराण उत्तर, नारद पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, लिंंग पुराण उत्तरार्ध, वराह पुराण, वराह पुराण उत्तरार्ध, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्माांड पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण ब्रह्माखंड, स्कंद पुराण अवंतीखंड, स्कंद पुराण प्रभासखंड.....*
*ठार मारलेले २१ राक्षस...*
*नारांतक, देवांतक, मधु, कैटभ, त्रिपुरासूर, सिंदुरासूर, व्यामोसूर, लोभासूर, मोहासूर, मदासूर, कमलासूर, विघ्नासूर, मत्सरासूर, देभासूर, अनसासूर, क्रोधासूर, मायासूर, कामासूर, मेषासूर, मलकासूर.....*
*गणपतीच्या २१ मूर्ती...*
*१. बाल गणपती, २. तरुण गणपती, ३. भक्ति विघ्नेश्वर, ४ वीरू-विघ्नेश, ५. शक्ति गणेश. ६. लक्ष्मी-गणपती, ७. उच्छिष्ट गणपती, ८. महागणपती, ९. उर्ध्व गणपती, १०. पिंगळा गणपती, ११. हेरंब गणपती, १२. प्रसन्न गणपती, १३. ध्वज गणपती, १४. उन्मत-उच्छिष्ट गणपती, १५. विघ्नराज, १६. भुवनेश गणपती, १७. नृत्य गणपती, १८. हरिदा गणपती, १९ भालचंद, २०. शर्पकर्ण, २१ एकदंत.....*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸अन्नपूर्णा स्तोत्र.🔸*
*ज्या घरावर अन्नपूर्णेची कृपा असते त्या घरातल्या माणसांना खाण्यापिण्याची ददात नसते, अर्थातच यात समृध्दीही आलीच आणि त्यामुळे ते घर सुखी असते. अशा अन्नपूर्णा मातेची परोपरीने स्तुति करून तिच्याकडे तिच्या कृपेची भिक्षा श्रीमद् शंकराचार्यांनी किती लीन भावनेने मागितली आहे हे वाचण्यासारखे (आणि ऐकण्यासारखेसुध्दा) आहे.*
*।।अन्नपूर्णा स्तोत्र।।*
*नित्यानन्दकरी वराभयकरी सौंदर्यरत्नाकरी।*
*निर्धूताखिल-घोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी।*
*प्रालेयाचल-वंशपावनकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपुर्णेश्वरी।।१।।*
*नानारत्न-विचित्र-भूषणकरी हेमाम्बराडम्बरी।*
*मुक्ताहार-विलम्बमान विलसद्वक्षोज-कुम्भान्तरी।*
*काश्मीराऽगुरुवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।२।।*
*योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्माऽर्थनिष्ठाकरी।*
*चन्द्रार्कानल-भासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी।*
*सर्वैश्वर्य-समस्त वांछितकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।३।।*
*कैलासाचल-कन्दरालयकरी गौरी उमा शंकरी।*
*कौमारी निगमार्थगोचरकरी ओंकारबीजाक्षरी।*
*मोक्षद्वार-कपाट-पाटनकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।४।।*
*दृश्याऽदृश्य-प्रभूतवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी।*
*लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपांकुरी।*
*श्री विश्वेशमन प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।५।।*
*उर्वी सर्वजनेश्वरी भगवती माताऽन्नपूर्णेश्वरी।*
*वेणीनील-समान-कुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी।*
*सर्वानन्दकरी दृशां शुभकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।६।।*
*आदिक्षान्त-समस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी।*
*काश्मीरा त्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्यांकुरा शर्वरी।*
*कामाकांक्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।७।।*
*देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुंदरी।*
*वामस्वादु पयोधर-प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी।*
*भक्ताऽभीष्टकरी दशाशुभकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।८।।*
*चर्न्द्रार्कानल कोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी।*
*चन्द्रार्काग्नि समान-कुन्तलहरी चन्द्रार्कवर्णेश्वरी।*
*माला पुस्तक-पाश-सांगकुशधरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।९।।*
*क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी।*
*साक्षान्मोक्षरी सदा शिवंकरी विश्वेश्वरी श्रीधरी।*
*दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलंबनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।१०।।*
*अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे !*
*ज्ञान वैराग्य-सिद्ध्यर्थं भिक्षां देहिं च पार्वति।।*
*माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः।*
*बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् II*
*आदि शङ्कराचार्यविरचितम् अन्नपूर्णा स्तोत्रम्।*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸अन्नपूर्णा देवी.🔸*
*अन्नपूर्णा , अन्नपूर्णेश्वरी, अन्नदा किंवा अन्नपूर्णा ( संस्कृत : अन्नपूर्णा, अन्नपूर्णा, शब्दशः अन्नाने भरलेली किंवा धारण केलेली ) ही पार्वतीची एक रूप आहे आणि तिला अन्न आणि आहाराची हिंदू देवी म्हणून ओळखले जाते... हिंदू धर्मात पूजा आणि अन्न अर्पण करण्याची खूप स्तुती केली जाते आणि म्हणूनच, अन्नपूर्णा देवी ही एक लोकप्रिय देवता मानली जाते. ती शिवाची परेद्रा , देवी पार्वतीची रूप आहे, आणि भरतचंद्र राय यांनी लिहिलेल्या बंगाली भाषेतील अन्नदा मंगल या कवितेत तिची स्तुती केली आहे. अन्नपूर्णा सहस्रनाम देवीला समर्पित आहे आणि तिच्या एक हजार नावांची स्तुती करते, तर अन्नपूर्णा शतनाम स्तोत्रम तिच्या १०८ नावांना समर्पित आहे.....*
अन्नपूर्णी देवीला समर्पित काही मंदिरे अस्तित्वात आहेत, त्यापैकी काही सर्वात प्रमुख म्हणजे होरानाडू येथे अगस्त्याने स्थापन केलेले अन्नपूर्णेश्वरी मंदिर आणि वाराणसीतील अन्नपूर्णा देवी मंदिर... अक्षय तृतीया ही अन्नपूर्णाची जन्मतिथी मानली जात असल्याने, सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो.....*
व्युत्पत्ती...*
*अन्नपूर्णा हा शब्द संस्कृतमधून आला आहे, ज्याचा अर्थ अन्न आणि पोषण देणारा असा होतो... अन्न (अन्न) म्हणजे "अन्न" किंवा "धान्य" आणि पूर्ण (पूर्ण) म्हणजे "पूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण".....*
हिमालयातील अन्नपूर्णा पर्वताचे नाव तिच्या नावावरून ठेवण्यात आले आहे असे मानले जाते... कारण देवी पर्वतांचा राजा हिमावत याच्या कन्यांपैकी एक असल्याचे मानले जाते. पाश्चात्य जग तिला "हिंदू स्वयंपाकाची देवता" असे नाव देते, कारण अन्नपदार्थांशी तिचा संबंध आहे.....*
अन्नपूर्णाची इतर नावे...*
*विशालक्षी (संस्कृत: विशालाक्षी) - ज्याचे डोळे मोठे आहेत...*
*विश्वशक्ति (संस्कृत: विश्वशक्ति) - जागतिक शक्ती...*
*विश्वमाता (संस्कृत: विश्वमाता) - जगाची आई...*
*सृष्टिहेतुकावरदानी (संस्कृत: सृष्टिहेतुकावरदानी) - ती जी जगासाठी वरदान देणारी आहे...*
*भुवनेश्वरी (संस्कृत: भुवनेश्वरी) - पृथ्वीची देवी...*
*रेणू - अणूची देवी...*
*अन्नदा (संस्कृत: अन्नदा) - अन्नदाता...*
*आख्यायिका...*
*एके दिवशी, देव शिव आणि त्यांची पत्नी पार्वती भौतिक जगाबद्दल वाद घालू लागले... शिव म्हणाले की, भौतिकवादी सर्व काही फक्त एक भ्रम आहे, ज्यामध्ये मानवांनी खाल्लेले अन्न देखील समाविष्ट आहे. यामुळे भौतिकवादी पैलूंवर नियंत्रण ठेवणारी पार्वती संतप्त झाली. शिव आणि जगाला तिचे महत्त्व दाखवण्यासाठी, ती गायब झाली आणि म्हणाली की तिला तिच्याशिवाय जग कसे टिकेल ते पहायचे आहे.....*
*पार्वतीच्या अदृश्यतेमुळे, जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला... शिवाच्या अनुयायांनी त्याला अन्नाची याचना केली; देवांनाही अन्नाची भीक मागण्यास भाग पाडले गेले, परंतु त्यांना अन्न मिळाले नाही. शेवटी, शिव आणि त्याच्या अनुयायांना समजले की, पृथ्वीवर फक्त एकच स्वयंपाकघर आहे, वाराणसी (काशी) शहरात, जिथे अजूनही अन्न उपलब्ध आहे.....*
*शिव काशीला अन्न मागण्यासाठी गेले... त्यांना आश्चर्य वाटले की, स्वयंपाकघर त्यांच्या पत्नी पार्वतीच्या मालकीचे होते, परंतु अन्नपूर्णाच्या रूपात. तिने स्वर्गीय जांभळे आणि तपकिरी वस्त्र परिधान केले होते, जे हलकेच अलंकारांनी सजवलेले होते. ती एका सिंहासनावर बसली होती, ती उपाशी देवांना आणि पृथ्वीवरील भुकेल्या रहिवाशांना अन्न देत होती आणि त्यांना अन्न वाटत होती. अन्नपूर्णाने शिवाला भिक्षा म्हणून अन्न अर्पण केले आणि त्यांना हे जाणवून दिले की, ब्राह्मण म्हणून, शिवाने कदाचित भूक वाढवली असेल; परंतु त्यांच्या अनुयायांनी तसे केले नाही.....*
*स्रोत: आंतरजाल...*
श्री गणेशोत्सव*
पुष्प १
ॐ गं गणपतये नमः
*पार्थिव गणेशाची स्थापना केव्हा पासून करतात ? गणपती बाप्पा विषयी काही माहिती ..*
याबाबत असे सांगितले जाते की ज्याला धर्म ग्रंथ आधार आहे की भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली गजानन प्रसन्न झाले व व्यासांनी गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडीत पणे चालू आहे.
आता आपण आपल्या गणपती बाप्पा विषयी काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया .
१] वडील = *भगवान शंकर*
२] आई = *देवी पार्वती*
३] मोठा भाऊ = *कार्तिकेय*
४] बहीण = *अशोकसुंदरी*
५] 2 पत्नी = *रिद्धी व सिद्धी*
६] 2 पुत्र = *शुभ व लाभ*
७] श्री गणेशाचे जन्मठिकाण = *दोडीताल,उत्तरकाशी/कैलास पर्वत*
८] श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला ? = *देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उटण्यापासून*
९] वाहन उंदीर/मूषकाचे नाव = *डिंक*
१०] शिव मानस पूजेत श्री गणेशाचे नाव = *प्रणव*
११] गणेशाची पूजा/भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव = *गाणपत्य*
१२] श्री गणेशाला प्रथमपूज्य का म्हणतात ? = *कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्याने*
१३] बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला ? = *भगवान शंकर*
१४] चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले ? = हत्तीचे शिर बसवून
१५] श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली ? = *लेखनिक*
१६] श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ = *मोदक,लाडू*
१७] आवडता रंग व फुल = *लाल,जास्वंदीचे*
१८] प्रिय पत्री = *दूर्वा,शमीपत्र*
१९] हातातील मुख्य अस्त्रे = *पाश,अंकुश*
२०] नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य १२ नावे = *सुमुख,एकदंत,कपिल,गजकर्णक,लंबोदर,विकट,विघ्ननाश,विनायक,धुम्रकेतू,गणाध्यक्ष,भालचंद्र व गजानन*
२१] श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली ? = *समर्थ रामदास स्वामी
आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही म्हणून हा सांगण्याचा प्रपंच .
आपणा सर्व भक्तांवर गणेशाची कृपाद्रीष्टी राहो सर्व भक्तांना आयु आरोग्य सुख समृद्धी व यश प्राप्ती हो हीच श्री चरणी प्रार्थना ....शुभम भवतु।
*श्री गणेशोत्सव*
पुष्प २
।।ओम वक्रतुंडाय नमः ।।
सर्वत्र श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता, असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. मात्र, घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली, याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो. जाणून घेऊया...
गणेशासंदर्भात अनेक पौराणिक कथा विविध ग्रंथातून संदर्भ मिळतात .
महाभारत लेखक गणपती
महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, महर्षी व्यासांनी महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणपतीकडून लिहून घेतले. घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली, असे सांगितले जाते. महाभारताची रचना करताना महर्षी व्यास आणि गणपती यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या. गणपतीला आपल्या लेखनाच्या गतीबाबत आत्मविश्वास होता. गणपती महर्षी व्यासांना म्हणाले की, तुम्ही महाभारत कथा हळूहळू सांगणार असाल, तर मला कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी. ही अट आपणास मान्य असेल, तर आणि तरच लेखनाची जबाबदारी मान्य करेन, अशी अट गणपतीने घातली.
महाभारत लेखनाचा श्रीगणेशा
व्यास महर्षी होते. गणपतीच्या अटीवर त्यांनी केवळ स्मित हास्य केले. महर्षी व्यास गणपतीला म्हणाले की, आपली अट मला मान्य आहे. मात्र, मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला, उमगला, तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे. अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे, अशी अट महर्षी व्यासांनी ठेवली. गणपती तयार झाले आणि त्यांनी महाभारत लेखनाचा श्रीगणेशा केला. महर्षी व्यास नेमके काय सांगताहेत हे समजून घ्यायला अनेकदा गणपतीला विलंब व्हायला लागला. संपूर्ण महाभारत कथा समजून लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते.
घरोघरी पार्थिव गणपती पूजन केव्हा पासून सुरू झाले
महाभारत कथा पूर्ण होण्यात मोठा कालावधी लोटला. कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. हा लेप लावून लावून जाडसर झाला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून महाभारताचा लेखक म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.
महाभारतकालीन गणपती अवतार
गणेशाने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात अवतार घेतल्याचे सांगितले जाते. गणेशाने सत्ययुगात कश्यप आणि अदितीकडे महोत्कट विनायकाच्या अवतार धारण केला. या युगात गणपतीने देवतान्तक आणि नरान्तक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केली आणि आपल्या अवतारकार्याची सांगता केली. गणेश त्रेता युगात मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले. तर, द्वापारयुगात गणेश उंदीरावर बसून प्रगट झाले. गणेशाला पौराणिक पत्रकार किंवा लेखक असेही संबोधले जाते. कारण याच युगातील अवतारात त्यांनी महाभारत लिहिले होते, असे सांगितले जाते.
पेशवे आणि घरगुती गणेशोत्सव
सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला. दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले. लोकमान्यांनी जनसामान्यांची एकत्रीकरण स्वातंत्र्या विषयी जन जागृती निर्माण करण्यासाठी गणेशोत्सवाचा फार प्रभावी उपयोग केला . आजचे हे पुष्प श्री गजाननाचे चरणी समर्पित .
हिंदुस्तान विश्वगुरु हो हीच गणरायाचे चरणी प्रार्थना ।
श्री गणेशोत्सव*
पुष्प ३
गणपती बाप्पाला तुळस का वाहत नाहीत ?
श्री गणपती म्हणजे चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती .. पण गणपतीचं आज घराघरांत आगमन मोठ्या जल्लोषात होतं . बाप्पाच्या पुजनात दुर्वांची जुडी आणि मोदकाचा नैवद्य अग्रस्थानी असतो. पण घराघरात पुजली जाणारी तुळस मात्र बाप्पाला वर्ज्य मानली जाते. वर्षातून फक्त एकच दिवस गणेश चतुर्थीला ती गणपतीला वाहिली जाते. सर्व देवदेवतांच्या पुजेत स्थान मिळवणाऱ्या तुळशीला गणेशपुजेत स्थान न देण्यामागं काही कथा सांगितल्या जातात. पौराणिक कथेनुसार, धर्मराजाची कन्या वृंदाने विष्णूसोबत विवाह करण्याचा हट्ट केला होता. तेव्हा देवाशी लग्नाऐवजी मानवी वर शोधू असं म्हटलं. त्यानंतर वृंदाने विष्णूची आराधना केली. ध्यानधारणा आणि तप केले. एकदा ती भगीरथी नदीच्या काठावरून जात असताना ध्यानाला बसलेल्या गणेशाला तिनं पाहिलं. त्याच्या तेजानं प्रभावित झालेल्या वृंदानं गणपतीला हाक मारण्यास सुरुवात केली. यामुळं त्याच्या तपस्येत अडथळा निर्माण झाला. याचं कारण गणपतीनं तिला विचारलं. त्यावर वृंदा म्हणाली, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. गणपती म्हणाला की, मी मोहपाषात अडकणार नाही. मी ब्रम्हचर्याच्या मार्गावर आहे. मी विवाह करणार नाही. गणेशाच्या या उत्तरानं आपला अपमान झाल्याचं समजून त्याला शाप दिला की, तुझा विवाह होईल. वृंदेन दिलेल्या शापावर गणपतीनंही शाप दिला की, तुझा विवाह एका राक्षसासोबत होईल. माझ्या पुजेत तुला स्थान नसेल. गणपतीच्या शापानंतर वृंदाला तिची चूक समजली. तिनं गणपतीची माफी मागितली. त्यानंतर वृंदानं गणपतीची उपासना केली. तेव्हा प्रसन्न होऊन गणपती म्हणाला की, तुला माझ्या पुजेत वर्षातून फक्त एकदात स्थान मिलेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुळस वाहता येईल. या दिवशी वाहिल्या जाणाऱ्या 21 प्रकारच्या पत्रींमध्ये तुलाही स्थान असेल मात्र इतर कोणत्याही दिवशी तुळस वाहता येणार नाही. पुढच्या जन्मात वृंदाचा जन्म एका राक्षसाच्या पोटी झाला. त्यानंतर महापराक्रमी अशा राक्षसासोबत विवाह झाला. त्याचा मृत्यू होताच तिनं चितेत उडी घेऊन प्राणत्याग केला आणि वृक्षरुपात तुळस झाली. त्यानंतर तुळशीला विष्णूपत्नी मानलं जाऊ लागलं. विष्णू पत्नी म्हणून तिची पुजा करतात मात्र तरीही गणपतीच्या पुजेत आजही तुळस वर्ज्य मानली जाते. फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपतीच्या पुजेत तुळशीला मान मिळतो. अशी ही तुळस औषधी पत्रित समाविष्ट होऊन श्री चरणी समर्पित झाली .
श्री विनायकाचे चरणी पुष्प ३ समर्पण इतकीच प्रार्थना या विश्वात शांतता व समृद्धी हो .सर्वत्र विश्वबंधुभाव हो . गणेशा चे कृपेने समृद्धी हो .
गणेश जन्माची कथा काय आहे ?
जगतपिते त्रिदेव भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर . निवासास असता एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते.
जगन्मातेने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला. तिने स्वतः मातीपासुन एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली.
आपल्या मंत्र शक्तीने तिने त्या मूर्तीत प्राण आणुन मुलाला जिवंत केले.
जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासुन नमस्कार केला. तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले, “तु माझा मुलगा आहेस. तुझे नाव गणेश.”
गणेश म्हणाला “आई, मला भुक लागली आहे. काहीतरी खायला दे ना.”गणेशला खाण्यासाठी तिने लाडु, मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले. गणेशला फार आनंद झाला. तो त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला.
पार्वतीने त्याला सांगितले “गणेश, मी माझ्या कक्षात अंघोळीला जात आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. इथेच थांबुन लक्ष ठेव.”
गणेश म्हणाला “हो आई, मी लक्ष ठेवेन. कोणालाही आत सोडणार नाही.”
पार्वती आत गेली. काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले.
ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागताच गणेशाने त्यांना अडवले.
“थांबा, आत जाऊ नका. माझी आई आत गेली आहे, तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे. तुम्ही इथेच थांबा.”
शंकर म्हणाले, “अरे मुला, हा माझाच कक्ष आहे. मी पार्वतीचा नवरा. मला मनाई नसेल केली तिने. तु वाट सोड.”
गणेश म्हणाला, “तुम्ही म्हणालात तसे असेल, पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते. कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगितले होते. त्यामुळे मी तुम्हाला आत सोडु शकत नाही.”
शंकराचा सेवक नंदी मध्ये पडला. तो म्हणाला “अरे मुला, तुला माहीत नाही, हेच या कैलास पर्वताचे अधिपती भगवान शंकर आहेत. हे त्यांचेच निवासस्थान आहे. तू त्यांना अडवण्याची चुक करू नकोस.”
गणेश म्हणाला, “तुम्ही कोण?”
नंदी म्हणाला “मी महादेवाचं सेवक, नंदी.”
गणेश म्हणाला “तुम्ही कधी महादेवांनी केलेली आज्ञा मोडाल का?”
नंदी म्हणाला “असे कसे होईल? माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा विचारही करू शकत नाही मी.”
गणेश म्हणाला “मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे सांगता? मलाही तिची आज्ञा मोडायची नाही. तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा, मी कोणालाही आत जाऊ देणार नाही.”
वाद वाढत गेला पण गणेश काही ऐकत नव्हता. त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती. शेवटी भगवान शंकर क्रोधीत झाले.
भगवान महादेवाच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटते. त्यांनी क्रोधीत होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर येईल ते भस्म करतात, सर्व जगाचा विध्वंस करण्याची त्यांच्यात शक्ती आहे.
त्वरेने सारे देव, ब्रह्मा, विष्णु स्वतः हजर झाले. त्यांनीसुद्धा गणेशाची समजुत काढली. पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता.
महादेवाचं क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशुल गणेशावर फेकले, एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर उडुन दिसेनासे झाले.
शंकर त्याला ओलांडुन आत जायला निघाले तोच पार्वती बाहेर आली.
गणेशाचे मस्तकहीन शरीर पाहुन तिला धक्का बसला. तिने प्रचंड आक्रोश केला. तिला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधीत झाली.
तिने शंकराला आणि उपस्थित सर्वाना जाब विचारला. “गणेश माझा मुलगा होता. मी त्याला निर्माण केले होते. तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता. आणि त्याने हे तुम्हा सर्वाना सांगुनही तुम्ही त्याला मारलंत. एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात? काय चुक होती त्याची?”
शंकर आता नरमले होते. “देवी, आम्हाला क्षमा कर. आम्हाला गणेशबद्दल माहित नव्हते. तो माझी वाट अडवुन बसला होता त्यामुळे मी क्रोधीत झालो.”
“माहित असो वा नसो, तो एक लहान मुलगा होता. त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको?”
“तुझे बरोबर आहे देवी. आम्हाला आता फार पश्चाताप झाला आहे.”
“त्याचा काही फायदा नाही. तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल? मला माझा मुलगा हवा आहे.”
“ते आता कसे शक्य आहे देवी? आमच्या त्रिशुळाने गेलेला जीव परत कसा येईल?”
“ते मला माहित नाही स्वामी. मला माझा मुलगा हवा आहे एवढंच मला ठाऊक आहे. तुम्हीच बघा कसं आणायचं ते.”
शंकर विचारात पडले. शेवटी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला, कि त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शीर आणावे.
त्यांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बाल हत्ती. त्यांनी त्याचे शीर आणले. महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शीर गणेशाच्या शरीरावर जोडुन गणेशला पुन्हा जिवंत केले. तोच आपला गणपती हत्तीचे शीर असलेला .
गणेशला सर्व देवांनी आशीर्वाद दिले. महादेवांनी देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला. त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात. प्रथम ईश्वर म्हणुन त्याचे एक नाव प्रथमेश आहे.
गजाचे आनन म्हणजे शीर असलेला देव म्हणून गजानन असेही नाव प्राप्त झाले आहे. हाच सर्व गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती हि नावे आहेत.
प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. गजाचे मस्तक असलेला गणपती बुद्धीचा देव आहे.
अशा या गणपतीची बाप्पाच्या जन्माची हि विलक्षण कथा आहे.
हा गणपती विद्येचा अधिपती , विघ्नांचा नाश करणारा विनायक सकल समृद्धी देणारा हा वरद विनायक होय ..आपण उत्सव काळात अत्यंत मनोभावे व श्रद्धेने गणेशाची उपासना करावी व जीवनात यशस्वी व्हावे हीच प्रार्थना . आपले कल्याण असो .शुभम भवतु ।
श्री गणेशोत्सव*
पुष्प ५
विषय ....गणपती पूजा यादी व रामदास स्वामींनी लिहीलेली आरती व त्याचा अर्थ
अ ) गणपती प्रतिष्ठापना सामानाची यापूजादी ..(.फक्त स्मरणासाठी)हळद, कुंकू, अक्षता, शेंदूर अष्टगंध, गुलाल, अत्तर, अत्तर वाहण्यासाठी थोडासा कापूस, उदबत्ती, धूप, कापूर, काडेपेटी, फुले, फुलांचा हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री (शमीचे पान, रुईचे पान, आघाडा, केवड्याचे पान इत्यादी), जानवे, पाण्याने भरलेला तांब्या, पळी आणि भांडे, ताम्हण, पंचामृत, तुपाची छोटी वाटी (निरांजनात तूप घालण्यासाठी), .समई , निरांजन कलश विड्याची पाने फळे नारळ प्रसादा साठी पेढे मिठाई पंचामृत , दूध अभिषेक पात्र,
ब ) गणपती आरती, शब्दश: अर्थ
*सुखकर्ता दु:खहर्ता = सुख देणारा दुःख हरण करणारा.....*
*अजूबाजूकडून सतत बातम्या येत असतात. त्या सुखाच्या व दुःखाच्या पण असतात. त्यातील विघ्नाच्या, दुःखाच्या राहू देऊ नको....,*
*नुरवी = न उरवी, फक्त प्रेम पुरव, दुःखाचा समुळ नाश करतो.....*
*पुरवी प्रेम कृपा जयाची = त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव भक्ताला लाभ होतो.....*
*सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची = गणेश सर्वांगाने सुंदर आहे. त्याने शेंदुराची उटी लावली आहे.....*
*कंठी झळके माळ मुक्ताफळांची = त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे.....*
*जय देव जय देव जय मंगलमूर्ति |* *दर्शनमात्रे मन कामना पुरती ||धृ||*
*म्हणजे = हे देवा, तुझा जयजयकार असो. तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस. तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.....*
*रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा = हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे. रत्नखचित फरा म्हणजे रत्नांचा तुरा. जसा मोराला, कोंबड्याला तुरा असतो तसा. तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे असे कृष्णलिला वर्णन आहे.....*
*चंदनाची उटी कुंकुमकेशरा = कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तु लावली आहे.....*
*हिरेजडित मुकुट शोभतो बरा = हिऱ्यानी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे.....*
*रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया = तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे.....*
*लंबोदर पीतांबर फणिवर बंधना = मोठे पोट असणाऱ्या, पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.....*
*सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना = सरळ सोंड व वाकडे तोंड असणाऱ्या,म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन त्याना सरळ मार्गावर आणणाऱ्या, त्रिनयना (३ नेत्र असणाऱ्या).....*
*दास रामाचा वाट पाहे सदना = हे गणपते, मी रामाचा दास (समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे.....*
*संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना = हे सुरवरवंदना = सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणाऱ्या हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.....*
*निर्वाणी = अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना.....*
*आता थोडे निरुपणत्मक:*
*सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |*
*या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.....*
*नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ||*
*म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.....*
*सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ता फळाची ||*
*त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.....*
*जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती |* *दर्शनमात्रे मन कामना पुरती || १ ||*
*त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. ‘दर्शनमात्रे’ च्या जोडीला काही भक्त तर ‘स्मरणमात्रे’ च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच ‘ये दिल मांगे मोअर’ म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रू पक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार?*
*पण इथे मला थोडा वेगळा अर्थ लावावासा वाटतो. मनोकामना, या शब्दाचे विघटन करावे वाटते. मन पूर्ण करतो (म्हणजे या देहीचे त्या देही घातले, किंवा माझे मन तुझे झाले, एकरूपता, किंवा ध्यानात गण-ईश, असा अर्थ लावूयात) नि कामना ही. इथे तो ईश आहे...., गुणाधीश जो ईश सर्व गुणांचा आहे, म्हणून विघटनात्मक, विनाशात्मक, कामना तो कसा पूर्ण करणार. विद्या-अधिपती म्हणतो, मग तो फक्त सकारत्मक वृत्तीचे जोपासन करेन, सत्याची बाजू घेईन, मित्र-शत्रू हे शब्द आपल्यासाठी, तो तर फक्त भक्तालाच जाणतो.....*
*या आरतीच्या दुसऱ्या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्र-संगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पितृदेव भगवान शंकर अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.....*
*रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा । *चंदनाची उटी कुंकुम केशरा ||*
*हिरे जडीत मुकुट शोभतो बरा |* *रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ||*
*पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणाऱ्या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घागऱ्यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.....*
*शेंदुरावरून आठवले, हनुमानाला शेंदूर एवढा का प्रिय आहे याचं उत्तर ‘रामचरित मानस’ मध्ये मिळतं. एकदा हनुमानाने सीतेला आपल्या भांगात शेंदूर भरताना पाहिलं. या गोष्टीचं हनुमानाला खूप आश्चर्य वाटलं. असं शेंदूर लावण्याचं कारण हनुमानाने सीतामाईला विचारलं. त्यावर सीता माई उत्तरल्या, “माझे पती श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी मी हा शेंदूर भांगात भरते..... धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत......”*
*सीतेचं हे उत्तर ऐकून हनुमंताने विचार केला, जर चिमुटभर शेंदूराने प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल, तर जर मी सबंध शरीरावर शेंदूर फासला तर प्रभू रामचंद्र अमर होतील. हाच विचार करून बजरंगबली हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर चढवण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच हनुमानाला शेंदूर चढवण्याची पद्धत निर्माण झाली. हनुमानास शेंदूर चढवणं हे श्रीरामांचंच पूजन असतं. त्यामुळे असा शेंदूर चढवण्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात.....*
*पूजनाच्या सोपस्काराचा शास्त्रार्थ तर आहेच पण वैज्ञानिक करणे देखील आहेत, शिवाय संत वचन, भक्तांची श्रद्धा, मूर्तीला स्पर्श करतानाची भावना, त्याला बाळ समजून किंवा सर्वाधीश समजून, समजून उमजून केलेली पूजा याची मजा काही औरच, ती फक्त अनुभवायची असते, शब्दामध्ये उतरवणे कठीण असते. आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोचतात. याचे अनुभव देखील आपल्या सर्वांना आहेतच.....*
*भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात:*
*सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं, लम्बोदरं सुन्दरं*
*प्रस्यन्दन्मद्गन्ध लुब्धमधुपब्यालोल गण्डस्थलम् |*
*दन्ताघात विदारितारिरुधिरैःसिन्दूरशोभाकरं*
*वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम् || (गणेशध्यानम्)*
*नामदेवांनी पण गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. ते म्हणतात,*
*लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड | करीतसे खंड दुश्चिन्हांचा ||*
*चतुर्थ आयुधे शोभतासी हाती | भक्ताला रक्षिती निरंतर ||*
*तिसऱ्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला दिसत नाही. त्रिनयना हे सूक्ष्मातले ध्यान आहे. तिसरे नेत्र हे दिव्य अशा ज्ञानचक्षूचे द्योतक आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातल्या मूर्तीला मध्यभागी तिसरा डोळा दाखवला आहे.....*
*लंबोदर पितांबर फणिवर वंधना |* *सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||*
*दास रामाचा वाट पाहे सदना |*
*संकटी पावावे सुरवर वंदना ||*
*अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुष्टी त्याला जोडून केली आहे). काही लोक शेवटची ओळ ”संकष्टी पावावे” असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात.....*
*सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला असेल असे मला तरी कधी जाणवले नाही. सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे.....*
*तीनशे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.....*
श्री वरद विनायकाची आपण व आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी हीच श्री चरणी प्रार्थना हे संग्रहित विशेष पुष्प माहिती व शास्त्रीय माहिती आपणा पर्यंत पोहोचविण्यासाठी . शुभम भवतु ।
घरातील देवपूजा करताना या 20 नियमांचे पालन करायलाच हवे.
ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते, नित्य देवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तेथे सुख, समृद्धी आणि सकारात्मक व पवित्र वातावरण नेहमीच असते. दुःख, दारिद्र्य दूर होते. नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो.
घरातील वातावरण शुद्ध राहते. हिंदु पुराणानुसार देवपुजेचे काही महत्वाचे नियम ठरवलेले आहेत. या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते. भगवंताची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते. महालक्ष्मी सह सर्व देवी-देवता आपल्यावर प्रसन्न राहतात.
1) तुळशीची पाने 11 दिवसा पर्यंत शिळी होत नसतात. त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात.
2) दिवा नेहमी परमेश्वराच्या मुर्तीसमोर ठेवला पाहिजे. तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी.
3) पूजेकरिता कधीही तुटलेला भग्न दिवा वापरू नये. तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही.
4) शिवजींना बेलाची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी.
5) कोणत्याही पुजेच्या वेळी आपल्या स्वेच्छेने देवाला दक्षिणा हिनक्की द्यावी. दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे. निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते. ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.
6) प्रत्येक पुजेमध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचे स्थान असते. पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे. तुकडे झालेले तांदूळ वापरू नये. हळदीचे पाणी करुन त्यात तांदूळ पिवळे करुन मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते. नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे.
7) विड्याची पाने देखिल पूजेसाठी अवश्य ठेवावी. वेलची, लवंग, गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर अतिउत्तम.
पूजेच्या मध्यभागी दिवा मधेच विझू नये याकडे विशेष लक्ष द्यावे. जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.
8.) कोणत्याही देवाला पूजा, ध्यान, आसन, स्नान, धूप-दीप, अक्षता (तांदूळ), कुमकुम, चंदन, फुले (फुले), प्रसाद इत्यादींना आमंत्रित (आमंत्रित) करणे आवश्यक आहे.
9) भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये.
10) पूजेच्या ठिकाणी स्वचछता आणि पवित्रता यांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये. चामड्याची कोणतीच वस्तू पुजा अर्चा करताना जवळ बाळगू नये. पूजाघर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. म्हणतात ना “हात फिरे तिथे लक्ष्मी वसे”
11) भगवान श्री विष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे. देवी दुर्गा, सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.
12) कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता, इष्टदेवता, वास्तु देवता, ग्रामदेवता यांचे स्मरण करुन त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे. पूजेसाठी सर्व देवतांचे आवाहन करायला हवे. पुजेच्या आधी देवांना स्नान घालावे, धूप दीप प्रज्वलित करावे, हळदी कुंकू लावावे तसेच पुष्प, बेलपत्र, चंदन, अक्षदा असणे गरजेचे असते.
13) आपण पुजेकरिता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकवू नये ते नेहमी हाताने सरकवावे.
14) आपण दररोज तूपाचे निरांजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात.
15) देवघराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेऊ नये.
देव्हाऱ्यावर काहीही ठेऊ नये . देवाला भार होतो .
16) देवतांना पुष्पहार, ताजीतवानी फुले, पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.
17) भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात, श्री विष्णूला चार, श्री गणेश यांना तीन आणि शिवजींना आर्धी प्रदक्षिणा घालावी.
18) घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंच लोकपाल, षोडश माता, साती आसरा यांचीही उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे.
19) या सर्वाबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात पंडित कडून मिळू शकते. विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे, जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल.
20) भगवान सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गामाता, शिवजी आणि श्रीविष्णू ह्या पंचदेवतांची पूजा अवश्य करावी. दररोज पूजा करताना
रोज घरात देवपूजा करून सकारात्मक वातावरण होते त्यामुळे पुण्यसंचय तर होतोच पण घरात अनुकूल व मंगल गोष्टी घडतात . दत्तनामात राहा कल्याण होईल शुभम भवतु .
: श्री गुरु लीलामृत
अध्याय ४९
भाग ०३
जप, तप, व्रत, नियम, अनुष्ठाने शाखाने प्रतिपादिली आहेत, ज्यांद्वारे स्वर्गप्राप्ती होवू शकते. यज्ञ करण्यास भरपूर खर्च येतो, त्याद्वारे स्वर्गाचे द्वार खुले होते. असे समजणारे समजतातही. पण म्हणून धन मोक्षास संपूर्ण कारण ठरत नाही. धन नाही म्हणून यज्ञ करता येत नाही व आपण मोक्षास मुकलो, असे समजण्याचे कारण नाही.
स्पष्टच सांगावे तर सर्वसंग परित्याग करण्यानेच मोक्षरूप प्राप्त होते हे जाणावे, ते सर्व या श्रीगुरुलीलामृत ग्रंथात यथामति वर्णन केले आहे.
आता 'आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति' अशी बृहदारण्य श्रुती आहे, तिचे निरूपण संक्षेपात करतो, ते परिसावे. आपल्या सुखाचे साधन आपण काय समजतो? पती, पत्नी, पुत्र, सोने, धन, संबंधित पशु, पक्षी हे आपल्या सुखासंबंधाने आपल्याला प्रिय असतात. ब्राह्मण क्षत्रियादि जाती, जमीन, बेद, श्रुती, स्थावर जंगम, सकल प्राणीमात्र असे जगतातील समस्त जीयांच्या प्रीतीचे जेवढे म्हणून पदार्थ आहेत, ते आपल्या सुखासाठी आपल्याला प्रिय वाटतात. दुसऱ्याच्या प्रिय भावना इवे गृहीत नसतात. दुसऱ्याच्या प्रिय पदार्थासाठी कोणी शक्यतो धडपडत नसतो. स्वतःच्या प्रिय पदार्थासाठी प्रत्येकाची घडारड असते. आपल्याला जो अनुकूल आहे त्यावरच जीवाची प्रीती राहते, आपल्याला प्रतिकूल असलेल्या जीवावर कुणाचे प्रेम नसते.
जो पुत्र स्वतःला अनुकूल त्यावर पित्याचा भारी जीब, पुत्रादिकाच्या प्रीतिस्तव नव्हे. स्वतःस उपयुक्त असेल ते प्रियः ज्याची उपयुक्तता नाही त्या अपत्याला पिताही प्रतिकूल असतो. माणूस दुसऱ्यासाठी नव्हे, स्वतःच्या अनुकुलतेने जगतो हे तात्पर्य, सुख देणारा म्हणून पती पत्नीला प्रिय. पतीला सुख देते म्हणून ती पत्नी पतीला प्रिय. आपल्या अनुकूल काळात प्रिय असणारा, विरोधात गेला की तो अस्तनीतला निखारा ठरतो.
म्हणजे, प्रत्येक जीवाला आपला आत्मा प्रिय असतो, हेच खरे. आसपासची माणसे काही कारणांनी प्रिय असतात. ती कारणे संपली की आपलेपणा परकेपणात बदलतो. प्रत्येकजण स्वतःच्या स्वभावानुसार, आपल्या गरजेनुसार, उपयुक्तता पाहून आपली प्रिय वस्तू ठरवित असतो. हे संबंध आत्मसंबंध म्हणून प्रियरूप नसतात. स्वभाव दृष्टीने प्रियरूप असतात. माणसाच्या स्वतःच्या संकल्पनेवर समोरचा प्रिय अप्रिय ठरविला जातो. ज्या काळात जीवाला पत्नीची इच्छा झाली व त्या त्या वेळी ती प्राप्त झाली, म्हणजे ती प्रिय ठरते. वियोग झाला की त्या व्यक्तिसंबंधाने मनुष्यजीव दुःख झाल्याचे सांगतो. म्हणजे हे सगळे तत्कालिक प्रिय पदार्थ अनात्म ठरतात. तसे आनंदस्वरूप आत्म्याचे नाही. तो परमशुद्ध आहे. तो जीवांचा प्रियतम आहे. प्रिय शब्दाहून अधिक उत्तम अवस्था प्रियतर ही, तर त्याहूनही प्रिय ते 'प्रियतम.'
प्रियतम कोण? तर जो कायम आहे तो! असा कोण आहे ? आत्मा हा प्रियतम आहे. त्याच्या सारखा दुसरा कुणी नाही. आत्मानंद लेश मात्र झाला तरी तो अनुभवणारा सर्वोच्च आनंद अनुभवतो. सर्व आनंदापेक्षा आत्मानंदाची स्थिती अत्याधिक म्हणून आत्मानंद हा उत्कृष्ट, असे वेद म्हणतात. हा आत्मानंद जे अखंडपणे अनुभवतात ती स्थिती वा ते लोक म्हणजे महात्मादिक उच्च जीव.
स्वर्गलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे आनंद आहेत ते विषयजन्य आहे. त्या आनंदापेक्षा अधिक महान व ज्यात वेगळेपणा उरला नाही असा तो ब्रह्मानंद, ब्रह्मानंद आपल्या जीवात्म्यापासून भिन्न नाही. कारण तोच सर्व जीवांचा आत्मारूप आहे. म्हणूनच आत्मास्वरूप आनंद हा नेहमी समस्त जीवाचा परमार्थपुरुष आहे. असा सर्व जीवाचा परमात्मा परमपुरुष, ज्याला सर्वदा सर्वचजण पूजतात. ज्याचे सर्वदा ध्यान केले जाते तोच परमपुंस नरवेष धारण करून प्रज्ञापुरी प्रकटला. वावरला.
श्रीस्वामी समर्थ महाराज जगदोद्धारासाठी अक्कलकोटात स्थिरावले. खरोखरीच अक्कलकोटच्या भाग्योदयाला काही पार नाही. ज्याप्रमाणे गोकुळात श्रीकृष्ण लीला करीत फिरले. नंदगोप व्रजादिकांनी पूर्णब्रह्म सनातन मित्र जोडला. तसेच परमानंद
क्रमशः
संजय वेंगुर्लेकर
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय १९ वा*
कानिफाकडून गोरक्षाला कळाले होते की, मच्छिंद्रनाथ खीराज्यात आहे. तेव्हा तो तत्काळ देशामागून देश ओलांडीत खीराज्याच्या सीमेवर पोहोचला. तो त्याला काही नर्तिका आत जातांना दिसल्या. त्यातली मुख्य होती तिचे नाव होते कलिंगा. ती म्हणाली, "आम्ही खी राज्यात जात आहोत. मैनाकिनी राणीसमोर नृत्यकला दाखवून आम्ही तिजकडून पुष्कळ धन मिळवून सुखी होऊ." गोरक्ष म्हणाला, "मी तुमचा साथीदार होतो" तुला काही कला येते का? गोरक्ष म्हणाला. "मी गायन करीन, मृदुंग वाजवीन." ती म्हणाली, असे म्हणतोस तर येथेच दाखव तुझे कौशल्य." गोरक्षाने भस्म मंत्रून कपाळाला लावले, ओठांना लावले, दाही दिशांना फेकले व वाद्याला लावले. त्याने गंधर्वप्रयोग केला होता. त्यामुळे असा चमत्कार झाला की, वृक्ष व दगडसुद्धा गायन करू लागले, वाद्ये वाजवू लागले. तो वनभाग स्वरांनी भरून गेला. तो प्रकार पाहून कलिंगा चकित झाली. तिला त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला. तिने मनात विचार केला, आपण याच्याच संगतीत राहावे. आपले कल्याण होईल. गोरक्षाला नाव विचारले पण गोरक्षाने 'पूर्वडा' असे आपले खोटेच नाव सांगितले. आपले खरे नाव सांगितले तर उगीच अडचण येतील, असे त्याला वाटले. गोरक्ष तिला म्हणाला, "मी बैरागी आहे, विषयभोग मला नको आहेत. धनसंपदा मला नको. एका वेळेस पोटापुरते मिळाले की झाले."
कलिंगा म्हणाली "ठिक आहे तेवढी गरज सहज भागेल. तू एक मात्र लक्षात ठेव. स्त्रीराज्यात तुला पुरूषवेषाने येता येणार नाही. तेथे पुरूष मरतात. मारूती भुभुःकार करतो. त्याचा प्रभावच असा आहे की त्यामुळे खिया गर्भ धारण करतात. पण मुलगा असला तर मरतो. मुलगीच फक्त जगते." गोरक्ष म्हणाला, "मारूतीचे भय मला नाही. तुम्ही चिंता नका करू. माझे योगबळ जास्त आहे." मग त्याने कलिंगा व इतर नर्तिका यांसह रथात बसून खीराज्यात प्रवेश केला. त्याने सीमेवरच वज्रास्त्र, स्पर्शाख, मोहनाख व नागाख यांचा संरक्षक प्रयोग करून ठेवला. ती सर्वमंडळी व गोरक्ष यांनी चिनापट्टण या गावात पहिल्या रात्री वस्ती केली. एक प्रहर रात्र झाली, चंद्र उगवला, चांदण्या रात्रीला सर्वजण निजलेले असतांना मारूती खीराज्यात शिरण्यासाठी सीमेवर आला. तोच वज्रास्त्र त्याच्या छातीवर आवळले. तो खाली पडला तोच स्पर्शाखामुळे जमिनील चिकटून राहिला. मोहनाखामुळे त्याला आपण कशासाठी आलो याचा विसर पडला आणि नागास्त्राने हातापायांना विळखा पडून मारुतीचे प्राणही कासावीस झाले. तेव्हा "हा कोणी तरी महाप्रतापी योगीच आपला शत्रू असावा व यातून सोडविणारा केवळ आपला रामप्रभूच आहे, दुसरा कोणी नाही." असे स्मरण होऊन मारूती रामाचा धावा करू लागला.
तेव्हा भक्ताच्या हाकेने श्रीराम तेथे प्रकट झाले. त्यांनी इंद्राखाने वज्रास्त्र निवारण केले, विष्णूच्या रुपाने मोहनाख, गरुडाखाने नागाख व विभक्ताखाने स्पर्शाख नाहिसे केले. मारुती सावध झाला. त्याला श्रीरामाचे दर्शन झाले. मारुती व श्रीराम 'हे अखबळ कोणाचे?' याचा विचार करू लागले. श्रीरामाने अंतर्ज्ञानाने जाणले की, नवनाथांपैकी हरि अवतार जो गोरक्ष त्याचेच हे कृत्य आहे. तो स्त्रीराज्यात आला आहे व चिनापट्टण गावात बस्तीला आहे. त्याने मारुतीला सांगितले. तेव्हा मारूती म्हणाला, "मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथ परत घेऊन जाईल. तेच टाळावयाचे आहे. तुम्ही मधुर बोलून त्याचे मन वळवा, माझी भक्ताची ही प्रार्थना ऐकाच!" श्रीरामाने मान्य केले व दोघे शाखे जाणणाऱ्या ब्राह्मणांची रुपे घेऊन चिन्नापट्टण गावात गेले. गोरक्ष निजला नव्हता. तो मच्छिंद्रनाथाचे स्मरण करीत एकटाच निवांत बसून आनंदाने डोलत होता. त्याच्यासमोर दोघे आले व त्याला नमस्कार करून बसले. मग गोरक्षाची श्रीरामाने प्रशंसा केली. त्याच्या दया, क्षमा, शांति, विरक्ति, विनय, निर्वैरीपणा आदि गुणांची फारच वाखाणणी केली. गोरक्ष प्रसन्न मनाने म्हणाला, "मित्रहो, मी तर स्वतःच बैरागी. मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा." ते म्हणाले, "आम्ही सांगू, पण तू नाकारशील. आम्ही याचक ब्राह्मण, तू वचन दे, मग सांगतो." गोरक्ष मोठा सावध होता.
तो विचार करू लागला, "या स्त्रीराज्यात पुरुष कसा येईल? आला तर मरेल. बरे सीमेवर आपण अखे पेरली आहेत. कसा येईल? देवता सुद्धा त्यात अडकतील. मग रात्री-अपरात्री हे ब्राह्मण येथे येतात नि माझी प्रशंसा करतात. मी एकटाच यांना हवा आहे. यांचा हेतू तरी काय असेल? हे कोणीतरी महान देवच असतील. मी मच्छिंद्राला नेण्यास आलो आहे. ते सोडून दुसरे काहीही बोलणे यांनी काढले तरी चालेल." मग तो मोठ्या विनयाने त्या ब्राह्मणांच्या पाया पडून म्हणाला, "स्त्रीराज्यात कोणीही पुरूष येणार नाही. मी पेरलेली अख्खे ओलांडून सुद्धा तुम्ही आलात, तेव्हा तुम्ही ब्राह्मण नव्हे. तुम्ही साक्षात विष्णू, महेश किंवा ब्रह्मदेव असाल. माझ्याजवळ ही माझी नाथपंथाची सामग्री तेवढी आहे. तुम्हाला मी काय वचन देणार?" असे बोलून तो त्यांच्या पाया पडला. श्रीरामाने मारुतीला खुणेने असे दाखविले की, आता आपले खरे स्वरुप याला दाखविले पाहीजे. मग श्रीराम व मारुती तिथे स्वतःच्या रुपातच प्रकट झाले. श्रीरामाने गोरक्षाला प्रेमाने आलिंगन दिले व म्हटले, "गोरक्षनाथ, मैनाकिनीने मारुतीकडून वरदान मिळवले आहे, वचन घेतले आहे व तुझे गुरु मच्छिंद्र यांना मागून घेतले आहे. तू इथे आला आहेस, पण मच्छिंद्रनाथांना तू परत नेऊ नयेस अशी मारुतीची इच्छा आहे. "
गोरक्ष म्हणाला, "तुमचे म्हणणे तुमच्या दृष्टीने ठिक आहे. पण आम्ही नाथपंथी. मच्छिंद्राने स्त्रीविलासात रमून रहावे हा आमच्या पंथाला काळिमा आहे. मी त्याला घेऊन जाणारच. तुम्ही काहीही म्हणा. आकाश खाली कोसळले, मेस्मांदार फुटून त्याचे तुकडे झाले, पृथ्वीप्रलय झाला तरी यात बदल होणार नाही. सांगून ठेवतो." हे त्याचे निर्धाराचे वचन ऐकून मारुती फारच संतापला होता, पण श्रीराम त्याला म्हणाले, "बायुपुत्रा, हे नाथपंथी माझे प्रिय भक्त आहेत. तू पण माझा भक्त आहेस. अरे, त्यांच्या कार्यात तू अडथळा आणणे योग्य नव्हे. राग आवर." श्रीराम मग गोरक्षाला म्हणाला, "गोरक्षनाथा, तुम्ही आपसात भांडू नका. मी आता स्वस्थानी जातो." तेव्हा गोरक्ष भावनेने भरून जाऊन म्हणाला, "प्रभू रामचंद्रा, मी अखे मंत्रून सीमेवर तुमच्या भक्ताला अडविले. तो माझा प्रमाद आहे. मला क्षमा करावी. माझी अत्रे काढून टाकण्यासाठी स्वतः रामप्रभुना श्रम पडावे? मला क्षमा करा." गोरक्षाचा विनयशील स्वभाव पाहून श्रीरामाने त्याला पुन्हा प्रेमाने पोटाशी धरले. त्याला निरोप देऊन तो आपल्या ठिकाणी गेला.
कर्पूर आरती
आरत्या म्हणून संपल्या कि आपल्याला वाटते आता कापूर लावुन कर्पूरगौरं म्हणायचे पण नाही त्याचा अर्थ कितीवेगळा *ब-याच* जणांना माहित नसतो
आपणही त्यातलेच
पण वाचा
*.....कर्पूर आरती!.....*
*कर्पूर आरतीचे अर्थानुसंधान!*
*कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि।*
*मन्दारमालाकुलतालकायै कपालमालांकितशेखराय दिव्याम्बरायै च दिगंबराय नम: शिवायै च नम: शिवाय।।*
मुख्य आरतीनंतर 'कर्पूर आरती' म्हणून म्हटल्या जाणा-या या आरतीचा कापूराशी काही संबंध नाही. केवळ सुरुवात 'कर्पूर' शब्दाने होते इतकेच.
हे भगवान शिवपार्वतीचे एक अतिशय सुरेख स्तवन आहे. अर्थानुसंधान ठेवले तर या स्तवनाने अधिक आनंद मिळतो.
१. कर्पूरगौरं : कापूराप्रमाणे शुभ्र, पवित्र असलेली गौरवर्णा (पार्वती,)
२. करुणावतारं : करुणेचा साक्षांत अवतार असलेले (शिव शंकर)
३. संसारसारं ( सार-असार सहित)
४. भुजगेन्द्रहारं : भुजंगाचा हार परिधान करणारे (शिव शंकर)
५. सदा वसं तं हृदयारविन्दे : तुम्ही माझ्या हृदयकमलात सदा निवास करावा (यासाठी)
६. भवं - शिवाला
७. भवानिसहितं - पार्वतीसह
८. नमामि-- नमन करतो, वंदन करतो.
९. मंदारमालाकुलतायकायै- मंदार पुष्पकलिकांच्या मालांनी सुशोभित (अशी) पार्वती, (आणि)
१०. कपालमालांकित शेखराय - नरमुंडमाला परिधान केलेले शिवशंकर
११. दिव्यांबरायै - दिव्य वस्त्र परिधान केलेली (पार्वती)
च - आणि -
१२. दिगंबराय - दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे अशा शिव शंकरांना नमन करतो. नम:
१३.शिवायै - पार्वती -च -आणि
१४ नम: शिवाय - शंकराला
वंदन करतो.
(पार्वती आणि शिवशंकर यांना अभिवादन करतो.)
*हे सुंदर स्तवन अनेकदा भरपूर अपभ्रंशांसह सरसकट म्हटले जाते. याचा अर्थ समजून घेणे नक्कीच आनंददायक आहे.*
🙏🏻🙏🏻
*🔸गौरीपूजन.🔸*
*गौरीपूजन हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे... गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात.....*
*गौरी शब्दाचा अर्थ...*
*संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या... तसेच गौरी म्हणजे पार्वती, पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.....*
*व्रताचे स्वरूप...*
*भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/ गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात... ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात....*
*आख्यायिका आणि इतिहास...*
*हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे... अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई, असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे. ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.....*
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली... त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.....*
*स्रोत: विकिपीडिया...*
*🔸ज्येष्ठा गौरी पूजन.🔸*
*अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात... तीन दिवस साजरा केल्या जाणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्या दिवशी विसर्जन करतात.....*
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या... तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.....*
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते... अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात.....*
गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात... थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.....*
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात... हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात.....*
माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे... माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.....*
तिसर्या दिवशी खीर- कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात... परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.....*
*आंतरजाल...*
*🔸समृद्धीच्या पावलांनी गौराई आल्या.🔸*
गणेशाच्या आगमनानंतर वेध लागले होते ते गौरींच्या आगमनाचे... वाजतगाजत, हळदीकुंकवाचे सडे घालत गौराईंची घराघरांत प्रतिष्ठापणा करण्यात आली. आता दोन दिवस गौराई घरात राहून आशीर्वाद देणार आहेत.*
‘पाऊस पडू दे, गंगा भरू दे, भादव्यात मी येईन गं... तेरड्याच्या फुलांवर, वस्ती मी करीन गं’ गेले महिनाभर असा निरोप पाठविणारी गौराई माहेरी आल्याने सगळीकडे आनंदी आनंद झाला आहे. गौराईला आणण्यासाठी फुलोरा घेऊन नदीवर, पाणवठ्यावर माता-भगिनींनी एकच गर्दी करतात. फुले, आघाडा, दुर्वा, कण्हेरीच्या फुलांच्या माळांनी सजविलेले, लखलखीत घासलेले तांब्या-पितळेचे न्हावण घेऊन आणि जरीच्या साड्या, अंगभर दागिने, हातभर बांगड्या लेवून गौराई गीते गात सर्वत्र हा सोहळा रंगतो.*
हिरवा शालू, नथ आणि विविध अलंकारांनी नटलेल्या या महिला आणि मुलींच्या सामूहिक आविष्काराला गौराई गीतांची सुरेल साथ लाभल्याने अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने घडते. झेंडू, गलाडासह विविध फुलांनी बाजारपेठ फुलते. फुलांचे प्रतिकिलो दर गगनाला भिडतात.*
ग्रामीण व शहरी भागात गौरीचे मुखवट्यांऐवजी काही ठिकाणी एरंडाची पाने वापरली जातात. काळानुरूप या मुखवट्यात बदल झाला असून, गौरीला आता टेक्नॉलॉजीचा स्पर्श होत आहे. त्यातूनच त्यांचे सुबक, रेखीव, अलंकारयुक्त असे मुखवटे उपलब्ध झाले आहेत. बाजारपेठांतील दुकानातून मुखवटे विक्रीस असतात.*
*गौरींपुढे झाली आरास*
*चैत्रागौरीसारखी आरास गणपती गौरींपुढेही करण्यात येते. लाडू, चकल्या, करंज्या यांसारख्या दिवाळीतल्या पदार्थांचीही या काळात रेलचेल असते. काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवण्यात येतात. काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात, तर काहींच्या घरी उभ्या. उभ्या महालक्ष्म्यांना पितळी किंवा लाकडी स्टॅण्डही असून, कोणी कोठ्यांना साड्या नेसवून त्यावर मुखवटे बसवतात. काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर काही पितळी तर काही लाकडाचे असतात. कोठ्यांना साड्या नेसवताना त्या कोठ्या लाडू, करंज्यांसारख्या मिष्टांन्नांनी भरून ठेवण्याची पद्धत काही भाविकांकडे पहायला मिळते.....*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
[31/08, 8:19 pm] +91 94201 13373: ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
*🔸कोकणात गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, कारण…*
*महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले चार लोकं एकत्र आले न की मग आमच्याकडे असं आणि तुमच्याकडे तसं हे विषय रंगतात... असाच विषय काल रंगलेला. निमित्त होतं गणपती आणि गौऱ्यांचं. आत्ता काही भागात गौराई न म्हणता लक्ष्मी म्हणतात. तर काही ठिकाणी गौरा म्हणतात. यावरूनच विषय सुरू झाला....*
मराठवाड्यातल्या लोकांनी त्यांच सांगितलं, पार गडचिरोलीमधल्या दोस्ताने तिकडच्या प्रथा सांगितल्या पण इटंरेस्टिंग वाटली ती कोकणातील प्रथा. कारण कोकणातल्या गड्यानं सांगितलं आमच्याकडे गौराईला चिकन, मटण असा नैवेद्य असतो.....*
कस शक्य आहे चिकन मटण ते पण थेट देवाला. म्हसोबा, बिरोबा अशा देवांना बकरं लागतं हे माहित होतं पण गौराईला पण ही गोष्ट पचायला थोडी जड होती त्यामुळं विस्ताराने शोध घ्यायचं ठरवलं तेव्हा कारण समोर आलं.....*
कारण आहे पौराणिक कथेचं.... या कथेनुसार पार्वती देवीचं लग्न महादेवासोबत अर्थात शंकरासोबत झालं... आत्ता शंकर हा स्मशानात राहणारा देव. लग्नानंतर पार्वती आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली. वाटेत पार्वतीच्या रक्षणासाठी महादेवांनी आपल्यासोबत स्मशानात असणाऱ्या भूतगणांना पाठवलं. या भूतगणांनी पार्वतीचं रक्षण केलं आणि पार्वती मातेला सुखरूप तिच्या माहेरी सोडलं.....*
माहेरी आल्यानंतर पार्वतीसाठी गोडधोड पदार्थ बनवण्यात आले. कौतुकसोहळा सुरू झाला... पण माहेरच्या लोकांच लक्ष्य भूतगणांकडे गेलच नाही. भूतगणांच्या जेवणाचं काय? नेमकं हे हेरलं ते माता पार्वतीने…..*
*तिने भूतगणांच्या जेवणाची सोय केली... मात्र भूतगण स्मशानात रहात असल्याने मांसाशिवाय ते दूसरं काहीच खात नसतं. त्यामुळे या भुतगणांना मांस देण्यात आलं. त्यामुळेच प्रथा पडली ती गौराईला मांसाहाराचा नैवेज्ञ द्यायची.*
*वास्तविक हा नैवैज्ञ गौराईसोबत आलेल्या भूतगणांना असतो... पण पौराणिक कथा माहित नसल्याने गौराईसाठीच हा नैवेज्ञ असल्याची मान्यता रुढ होत गेली.....*
*स्रोत: आंतरजाल, बोलभिडु...*
*🔸श्रीमहालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय?🔸*
*ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक.*
*भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस श्रीमहालक्ष्मी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती श्रीमहालक्ष्मी विषयी उपलब्ध आहे.*
जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठा लक्ष्मी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली- वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात.*
*नोट :-*
*भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्रीलक्ष्मी हे जेष्ठागौरी आहे पण जेष्ठागौरी श्री शंकरांची पत्नी म्हणजे देवी पार्वती म्हणजे जेष्ठागौरी आहे यांचे पुजन चैत्र सह जेष्ठ महिन्यात व श्री मंगळागौर ही श्रावण महिना पुजन करण्यात येते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या दोन श्रीमहालक्ष्मी कश्या या बद्दल श्री वेद वाड्मयत सुद्धा ‘नमो जेष्ठाच च कनिष्ठाय च’ ‘स्तेतानां पतये नमः’ अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.*
*मी समुद्र मंथन या लेखात सांगितल्या प्रमाणे मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्याची बहीण श्रीअलक्ष्मीचा जन्म झाला. श्रीमहालक्ष्मी म्हणजे (येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी (म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात.*
याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्रीविष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थ(पिंपळाचे झाड) वृक्षा खाली रडत बसली.*
तिथुन श्रीविष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.*
*या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो. श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचेआवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.*
अष्टमीच्या दिवशी श्रीलक्ष्मी पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे ‘श्रीमहालक्ष्मी व्रत’ असे मानतात.*
श्रीमहालक्ष्मी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे. श्रीमहालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो.*
*प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास.*
गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.*
*पुजन माहिती.*
श्रीमहालक्ष्मीचे आवाहन.*
*श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार प्रवेश दारातुन अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणलं जातं.*
*देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं. श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचेदेखील बनविलेले असतात . श्रीमहालक्ष्मीना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात.*
श्रीमहालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्रीलक्ष्मी च्यापुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात.*
*श्रीमहालक्ष्मी पुजन माहिती.*
दुसर्या दिवशी जेष्ठा नक्षत्रावर आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणा कडे सकाळी, दुपारी, किवा संध्याकाळी किवा रात्री महापुजन करतात यात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.*
तिसर्या दिवशी तिला खीर कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात. अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.*
श्रीमहालक्ष्मीची कहाणी.*
( ही कहाणी दुसर्या दिवशी महापुजन झाल्यावर वाचावी..)*
*आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी श्रीमहालक्ष्मी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी श्रीलक्ष्मी आण! आई म्हणाली, बाळांनो, श्रीलक्ष्मी आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई श्रीलक्ष्मी आणेल!*
वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.*
बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.*
सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.*
*म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्या दिवशी खीर केली.*
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!*
श्रीमहालक्ष्मी नं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. श्रीमहालक्ष्मी आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठाअलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.*
*स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.....*
*🔸चौदा विद्या, चौसष्ट कला.🔸*
*श्री गणेश हे चौदा विद्या, चौसष्ट कलांचे दैवत आहे... श्रीगणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण श्रीगणेशपूजा करीत असतो... पण गणरायाच्या या चौदा विद्या, चौसष्ट कला तुम्हाला माहिती आहे का चौदा विद्या .....?*
श्रीगणेश विषयक माहिती असलेले प्राचीन ग्रंथ श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्गलपुराण हे आहेत... आजही हे प्राचीन ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत.....*
श्रीगणेशांना चौदा विद्या अवगत होत्या, श्रीगणेश मोठे ज्ञानी होते... ज्याच्याजवळ जे असते तेच तो दुसर्याला देऊ शकतो. श्री गणेश स्वत: ज्ञानी व प्रगल्भ बुद्धिमान असंल्यामुळेच त्यांचा आदर्श आपण ठेवला, तर आपणही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागतो. अधिक बुद्धिमान होण्यासाठी अधिक मेहनत घेऊ लागतो. श्रीगणेशाला बुद्धिदाता म्हणजे बुद्धी देणारा असे म्हटले आहे.....*
श्रीगणेशांना पुढील चौदा विद्या अवगत होत्या... (१) ऋग्वेद (२) यजुर्वेद (३) सामवेद (४) अथर्ववेद (५) छंद (६) शिक्षा (७) व्याकरण (८) निरुक्त (९) ज्योतिष (१०) कल्प (११) न्याय (१२) मीमांसा (१३) पुराणे आणि (१४) धर्मशास्त्र.....*
काही विद्वानांच्या मते पुढील चौदा विद्या श्रीगणेशाला अवगत होत्या...*
*(१) आत्मज्ञान (२) वेदपठण (३) धनुर्विद्या (४) लिहीणे (५) गणित (६) पोहणे (७) विकणे (८) शस्त्र धरणे (९) वैद्यक (१०) ज्योतिष (११) रमलविद्या (१२) सूपशास्त्र (१३) गायन आणि (१४)गारुड.*
आणखी इतर ग्रंथांमधून वेगवेगळ्या विद्या सांगितलेल्या आहेत... आधुनिक काळांत विद्यांची संख्याही अनेक पटीने वाढली आहे. यावरून एकच म्हणता येईल की, गणपती हे सकल विद्यांचा अधिपती होते. सकल ज्ञानी होतज. बुद्धिमान होते. म्हणूनच अथर्वशीर्षामध्ये श्रीगणेशांना ‘ तू ज्ञान आहेस ‘ असे म्हटले आहे.....*
श्रीगणेशांना चौदा विद्यांबरोबरच चौसष्ट कलाही अवगत होत्या... शिवतत्त्वरत्नाकर ग्रंथामध्ये पुढील चौसष्ट कला सांगितलेल्या आहेत.....*
(१) इतिहास (२) आगम (३)काव्य (४) अलंकार (५) नाटक (६) गायकत्व (७) कवित्व (८) कामशास्त्र (९) दूरोदर (१०) लिपिज्ञान (११) लिपिकर्म (१२) वाचन (१३) गणन (१४) व्यवहार (१५) स्वरशास्त्र (१६) शाकुन (१७) सामुद्रिक (१८) रत्नशास्त्र (१९) गंज-अश्व-रथ-कौशल (२०) मल्लशास्त्र (२१) सूपशास्त्र (२२) बागाईत (२३) गंधवाद (२४) धातुवाद (२५) रससंबंधी (२६) बिलवाद (२७) अग्निसंस्तम्भ (२८) जलसंस्तम्भ (२९) वाक् स्तंम्भन (३०)वायुस्तंभन (३१) वशीकरण (३२) आकर्षण (३३) मोहन (३४) विद्वेषण (३५) उच्चाटन (३६) मारण (३७) कलवंचन (३८) परकायाप्रवेश (३९) पादुकासिद्धी (४०) वाक्सिद्धी (४१) गुटिकासिद्धी (४२) ऐन्द्रजालिक (४३) अंजन (४४) परदृष्टिवंचन (४५) स्वरवंचन (४६) मणिभूमिकर्म (४७) मंत्रऔषधी (४८) कर्म (४९) चित्रक्रिया (५०) लेहक्रिया (५१) अश्मक्रिया (५२) मृत्क्रिया (५३) औषधक्रिया (५४) वेणुक्रिया (५५) चर्मक्रिया (५६) अम्बरक्रिया (५७) अदृश्यकरण (५८) दन्तिकरण (५९) मृगयाविधी (६०) वाणिज्य (६१) पशुपालन (६२) कृषी (६३) आसनकर्म (६४) युद्धकौशल्य.....*
आधुनिक कालात कलांची संख्याही अनेकपटीने वाढली आहे... या काळात माणसाने एक तरी कला आत्मसात करणे आवश्यक आहे. आयुष्यात प्रत्येकाला आवडीच्या विषयातील नोकरी मिळतेच असे नाही. पण आवडीच्या विषयाची कला मात्र जोपासता येते. दु:खाच्या वेळी अवगत असलेली कला मनाला आधार देते तर सुखाच्यावेळी कला माणसाचे सुख द्विगुणित करीत असते.....*
*स्रोत: आंतरजाल, By शरयू काकडे...*
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय १८ वा*
गोपीचंद राज्यत्याग करून निघाला आहे. ही बातमी त्याच्या देशात सगळीकडे पसरली. जो तो राजाला थांबवून घेऊन राहण्याचा आग्रह करीत होता. नाना पकाने अर्पण करीत होता, पण त्या विरक्त महापुरूषाने मिक्षाच तेवढी घेतली. कोठेही तो जास्त वेळ थांबला नाही. गौड देश मागे पडला. कौल देश लागला. तेथे पौलपट्टण गाव राजधानीचे होते. तेथील राजा तिलकचंद महाबलाढ्य, पराक्रमी व मोठे सैन्य बाळगून होता. गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती. तेथेही गोपीचंदाची बातमी आधीच कळली होती. पण तेथे राजा व चंपावतीचे सासरे, सारे लोक गोपीचंदाची निंदाच करू लागले. भावाची निंदा ऐकून चंपावतीला फार दुःख झाले, पण करणार काय! ती मुकाट्याने बोलणी खात होती. गोपीचंद पौलपट्टणात गेला व एका पाणवठ्याजवळ जाऊन बसला. 'जय गुरूदेव!' असे नामस्मरण तो करीत होता. चंपावतीच्या दासी तिकडून जात होत्या. त्यांनी त्याला पाहिले व ओळखले आणि चंपावतीला तसेच तिलकचंदाला व चंपावतीच्या पतीला पण सांगितले. राजाला बाटले, "हा सुनेचा भाऊ गावात भिक्षा मागेल, तर आपले हसे होईल. आपल्याला तोंड बाहेर काढणे नको होईल." त्याने सेवकांना सांगीतले, "अरे, तुम्ही त्या गौडदेशाच्या भिकारी राजाला पागेत आणून ठेवा. पण त्यापेक्षा चंपावतीच्या स्वतःच्या दासींना पाठवा. त्याचं हे काम करतील." झाले. अशी आज्ञा देऊन राजा राजसमेत गेला. चंपावतीच्या दासी गोपीचंदाला बोलवायला गेल्या. गोपीचंदाने म्हटले, "आम्ही बैरागी! आमच्या बहिणी सर्वच घरी! चंपावती काय वेगळी?" दासी म्हणाल्या, "महाराज, तुमच्या बहिणीचे मन मोडू नका!" मग एकदा स्वतः भेटून चंपावतीचा निरोप घेऊन जावे, असे म्हणून गोपीचंद राजवाड्यात गेला. मग राणीने उत्तमोत्तम अन्नपदार्थ वाढून त्याला भोजन पाठवले. एका तरूण दासीने ते ताट गोपीचंदाला नेऊन दिले व म्हटले, "महाराज, जेवण करा. गोपीचंदाला अपामर वाटले, "या सोयऱ्यांनी मला अपमानाने पागेत बसविले आणि दासीने अन्न आणून दिले." पण पुन्हा त्याने विचार केला, "मी तर आता राजा नाही, मी जोगी. मला सारे सारखे. शत्रु-मित्र हा भेद नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्यात काहीच दोष नाही." आणि त्याने गुरूस्मरण करून अन्नाचा घास घेतला. दासींनी चंपावतीला हळूच बोलावून गवाक्षातून तो बैरागी भाऊ दाखविला व मग त्या दूर गेल्या. "तो तुमचा भाऊ ना? राजा ना? मग येथे का ओशाळ्यासारखे खात बसलाय ? त्याला जोगी कुणी हो केलं? तुम्हाला हा भणंग भिकारी भाऊ पाहून काहीच कसं वाटत नाही?" इत्यादी प्रकाराने हिणवून त्या चंपावतीला प्रश्न विचारू लागल्या. मग तिच्या नणंदा, जावा याही तिच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. ते कटू शब्द ऐकून चंपावतीला भयंकर दुःख वाटले, राग व दुःख यांच्या तिरीमिरीत तिने एकटी असतांना आपल्या पोटात खंजीर खुपसून घेतला. ती धाडकन जमिनीवर पडली. रक्ताचे थारोळे झाले. ती गतप्राण झाली. दासी मग अंतःपुरात गेल्या. पाहातात तो काय, चंपावती तिच्या महालात मरून पडलेली, हातात खंजीर तसाच. दासी एकदम किंचाळल्या. सगळ्या राजवाड्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली. सगळे सेवक, दीर, नणंदा व जावा नाना तर्ककुतर्क करू लागल्या. "भावाच्या अपमानाने चंपावतीने जीव दिला" असे कोणी म्हणू लागले. "गोपीचंद आला नी ही सून मेली." म्हणून त्यालाच कोणी अपशकुनी म्हणू लागले. राजवाड्यात झालेला कोलाहल घोडशाळेपर्यंत पोहोचला. "चंपावती राणीने खंजीर खुपसून जीव दिला. तिचा गोपीचंद नावाचा भाऊ आपले राज्य सोडून भिकाऱ्यासारखा भटकतो, त्याचे तिला फार दुःख झाले." गोपीचंदालाही ही हकीकत समजली. त्याला फार वाईट वाटले. 'आपण येथे आलो नि चंपावतीच्या मरणाला कारण झालो, या गोष्टीचा विसर कोणालाच पडणार नाही. हे काही ठीक नाही.' अशा विचाराने त्याला बाईट वाटले. इकडे चंपावतीचे प्रेत जाळण्यासाठी लोक स्मशानाकडे नेत होते. गोपीचंदही उठला व त्या लोकांबरोबर गेला, 'नाथपंथाचा तिरस्कार व हेटाळणी
करणाऱ्या या लोकांना चमत्कार दाखवून त्यांची तोंडे बंद करावी' असे गोपीचंदाने ठरविले. तो चंपावतीच्या प्रेताजवळ उभा राहिला व लोकांना म्हणाला "लोकहो, मी चंपावतीला पुन्हा जिवंत करतो. तुम्ही थांबा. माझे गुरू जालंदरनाथ यांना येथे आणतो." पण लोकांचा विश्वास बसेना. ते म्हणू लागले, "मृत माणूस कधी जिवंत होणार आहे का?" तो वारंवार सांगत होता, तरी त्याचे कोणी ऐकले नाही. "चार दिवस धीर धरा, मी आत्ता जातो. जालंदर ऋषींची सिद्धी अपूर्व आहे." असे तो अगदी जीव तोडून सांगत होता. तरी लोकांनी चिता रचली व चितेला अग्नी देण्याची तयारीसुद्धा केली. तेव्हा गोपीचंद स्वतः चितेवर जाऊन बसला व ओरडला, "जाळता ना? मग मला पण जाळा. मी जळलो तर मग पाहा जालंदर येईल आणि तुमचे भस्म करील!" लोक म्हणू लागले, "गोपीचंद बेडा झालाय." तिलकचंद राजा म्हणाला, "हा बैरागी गुरूच्या नावाने गर्व करतोय. काय रे काय चमत्कार करशील?" तो म्हणाला, "गुरू बोलतील तसे होईल." मग तिलकचंद म्हणाला, "चंपावतीच्या प्रेताचा डावा हात काढा. याला द्या. तो घेऊन हा गुरूकडे जाईल. चितेवरून खाली उतर" असे म्हणून तिलकचंदाने प्रेताचा डावा हात तोडून दिला व त्याला जायला सांगितले. तो येई पर्यंत प्रेत न जाळण्याचे व राखून ठेवण्याचे कबूल केले व गोपीचंद हेलापट्टण नगरापासून पाच कोसापर्यंत आला. त्याच्या हाती बहिणीच्या प्रेताचा डावा हात होता. हा नगरात आला तर सगळीकडे नसता बोभाटा होईल, हे जालंदराने अंतदृष्टीने जाणून प्रयाणास्त्र जपून भाळी भस्म लावून तो योगी वायुवेगाने गोपीचंदाला वाटेतच भेटला व त्याने "का आलास?" असे त्याला विचारले. गोपीचंदाने सर्व वृत्त सांगीतले. मग जालंदर गोपीचंदासह पौलपट्टणाला वायुवेगाने आला. राजप्रासादाच्या अंगणात ते शिरले. तेथे सर्व लोक शोक करीत होते. दोघांना पाहून ते लगेच उठले. तिलकचंद चकित झाला. "चार दिवसां ऐवजी प्रहराच्या आत गोपीचंद व जालंदर आले. बाप रे! हा योगी केवढा तेजस्वी दिसतो!" असे मनाशी म्हणत राजा धावला. तो जालंदराला फार सन्मानाने वागवू लागला. पण त्याने केलेला हा सत्कार दांभिक होता. गोपीचंदाचा त्याने केवढा अपमान केला नी त्याच्या बहिणीला किती मनस्ताप दिला व त्यामुळे तीने जीव दिला, हे जालंदराला कळाले होते. प्रेताचा हात हातात घेऊन जालंदराने संजीवनी मंत्र म्हटला व भस्म त्या हातावरच टाकले व तत्काळ "चंपावती, चल उठून ये!" असा आदेशही दिला. त्यावेळी आश्चर्य असे झाले की चंपावती चितेवरून उठून क्षणार्धात तिथे आली. हे अपूर्व योगसामर्थ्य पाहून राजासह सर्वजण जालंदरनाथाचा जयजयकार करू लागले. नंतर जालंदर पुन्हा हेलापट्टणास जाण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्या दयेची भीक मागून तिलकचंदाने "सर्वांनी एकत्र भोजन करावे व मगच नाथांनी जावे." अशी प्रोर्थना केली. ती मान्य करून चंपावतीलाच स्वयंपाक करण्यास सांगितले. पतीसह तिला आपल्याजवळ जेवणासाठी बसवून संजीवनीविद्येचा प्रसाद म्हणून जालंदराने आपल्या पात्रातील घास भरविला व तिला अमरत्व दिले. जालंदराने जातांना सांगीतले, "तिलकचंदा, गोपीचंद पूर्ण तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जात आहे. त्याचा पुत्र मुक्तचंद राज्यावर बसविला आहे. तू त्याचे रक्षण कर." ते राजाने मान्य केले. मग जालंदर हेलापट्टणास परत गेला. तेथे त्याने मुक्तचंदाला राज्यकारभाराचे शिक्षण दिले. मग तो व कानिफ पुन्हा बदरिकाश्रमात पोहोचले. तोपर्यंत बारा वर्षे गेली. गोपीचंदाचे तप पूर्ण झाले होते. मग जालंदराने गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करून घेतले. सर्व विद्या शिकवून, सर्व देवतांना बोलावून त्यांच्याकडून सर्व मंत्रांना वरदाने देवविली. अशी जालंदराने गोपीचंदाची पूर्ण तयारी करून घेतली.
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
*शुक्ल ब्राम्हणावर कृपा केली*
महोत्कटाच्या अतर्क्य लीला पाहुन काशीनगरातील लोकांना त्याच्याविषयी नितांत आदर वाटत होता. तो मनुष्यरुपाने अवतरलेला देवच आहे. आपण त्याला घरी आणावे, त्याची पूजा करावी, त्याचे उत्तम आदरातिथ्य करावे असे प्रत्येकालाच वाटत होते. एके दिवशी काही मान्यवरांनी राजाची भेट घेतली. महोत्कट तेथेच होता. आलेल्या लोकांचा मनोभाव जाणून त्याला मोठे समाधान वाटले. लोकांनी हात जोडून मोठ्या आशेने राजाकडे पाहिले. त्यांना राजाने हसून संमती दिली. प्रजाजनांना मोठा आनंद झाला. महोत्कटाला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन ती सर्व मंडळी आपापल्या घरी परतली.
काशी नगरात शुक्ल नावाचा एक सत्शील ब्राह्मण राहत असे. तो भिक्षा मागून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवित असे. तो लगबगीने घरी आला व आपली पत्नी विद्रूमा हिला म्हणाला, “आज नगरामध्ये महोत्कटाचे आगमन होणार आहे. तो लोकांची पूजा स्वीकारून प्रत्येकाकडे थोडे थोडे अन्नग्रहण करणार आहे. तो आपल्याकडेही येईल. तू स्वयंपाक तयार ठेव. विद्रुमेस आनंद झाला. तिने उत्साहाने स्वच्छता केली. दारापुढे रांगोळी काढली. भाकरी आणि तांदळाची पेज तयार केली. शुक्ल ब्राह्मणांनी आपल्या जवळचे किडूकमिडूक विकून पुष्पहार, पत्री, वस्त्र, फळे, कंदमुळे, तेल तूप आदी साहित्याची जमवाजमव केली. त्याने दर्भाचे आसन मांडले. महोत्कटाच्या पूजेची सर्व सिद्धता केली. दक्षिणा बाजूला काढली. नित्यकर्मे आटोपून तो विनायकाची वाट पाहू लागला.
महोत्कटाने स्नानादी कर्मे उरकली आणि प्रजाजनांना भेटण्यासाठी तो नगरात प्रवेशला. तो प्रथम शुक्ल ब्राम्हणाच्या घरी गेला. त्याला पाहून त्या ब्राह्मण दांपत्यास परमानंद झाला. त्याला पाहून विद्रुमाला रडू आवरत नव्हते. त्या दोघांचा तो शुद्ध सात्विक भक्तिभाव पाहून महोत्कट प्रसन्न झाला. ब्राम्हणानी त्याची पूजा केली. विनायकाने त्याच्या घरची पेज आणि भाकरी आवडीने खाल्ली. तो निघून जाताच त्या गरीब ब्राह्मणाचे घर सर्व ऐश्वर्याने संपन्न झाले.
ब्रह्मदेव व्यासांना महोत्कटाचे चरित्र सांगत होते. व्यासांनी त्यांना विचारले, “हे विधाता, काशीमध्ये गणपतीचे अनेक निस्सीम भक्त होते, तरीही महोत्कटाने शुक्ल ब्राम्हणाला प्रथम प्राधान्य दिले, असे का?” ब्रह्मदेव म्हणाले, “हे मूने, तो ब्राह्मण सत्शील होता. धर्मानुगामी, प्रेमळ सद्भक्त होता. सर्वसाक्षी महोत्कटाने त्याची अनन्य भक्ती जाणूनच त्याच्या घरची पूजन आदी सेवा स्वीकारली. तो भावाचा भुकेला आहे, भक्तीला वश होणारा आहे. मी तुला या विषयाची एक कथा सांगतो, ती ऐक.”
*भीम व्याधाचा आणि राक्षसाचा उद्धार*
प्राचीन काळी विदर्भ देशातील मंद नगरात भीम नावाचा एक व्याध राहत असे. तो अरण्यात जाऊन शिकार करायचा. त्या नगरात कसलातरी उत्सव साजरा करण्यात येणार होता. त्याप्रसंगी मांसाची उत्तम विक्री होईल असा विचार करून तो व्याध अरण्यात गेला. त्या अरण्यात एका राक्षसाचे वास्तव्य होते. तो या व्याधाला खाण्यासाठी धावला. त्याला पाहताच भयभीत झालेला व्याध प्राणरक्षणार्थ एका शमी वृक्षावर चढून बसला. त्याला गाठण्यासाठी राक्षसही त्या वृक्षावर चढू लागला. त्याच्या भाराने तो वृक्ष कोसळला. दोघेही खाली आपटले. त्यात शमी वृक्षाखाली वामनाने स्थापन केलेली एक गणेश मूर्ती होती. झाड खाली पडताना त्याची बरीचशी पाने त्या मूर्तीवर पडली. त्या पुण्याइने राक्षस आणि व्याध यांच्या सर्व पातकांचा नाश झाला. गणेश कृपेने मुक्त होऊन ते दोघेही गणेशलोकी गेले.
व्यास म्हणाले, “हे विधाता, गणेशमूर्ती वर शमी पत्रे पडल्यामुळे भीम व्याध आणि राक्षसाचा उद्धार झाला, हे कसे? ब्रह्मदेव म्हणाले, “या विषयीचा समग्र वृत्तांत सांगतो, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.” ब्रम्हदेव सांगू लागले.
भीम व्याध एका जन्मात राजा होता. त्याचे नाव होते सांब. सत्ता आणि संपत्ती हाती आल्यामुळे तो राजा उन्मत झाला. एके दिवशी सांब व त्याचा प्रधान शिकारीसाठी गेले होते. ते शिकारीवरून परतत असताना त्यांना गणपतीचे एक पडीक देऊळ दिसले. येथील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राजा दशरथाने कुलगुरू वसिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली होती. हे देवस्थान वरदविनायक या नावाने प्रख्यात होते. राजाने व प्रधानाने त्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याला रानातील रानपुष्प अर्पण केली व नमस्कार केला. त्या दोघांकडून जन्मभरात हे एकच पुण्यकर्म घडले होते. कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला. यमाने नरकात घालून त्यांना असंख्य यातना दिल्या. पुढे कीटक, पशु, पक्षी चांडाळ अशा अनेक अशुद्ध योनीमध्ये जन्म घेऊन ते दोघे व्याध आणि राक्षस झाले. गणेश मूर्तीवर शमीपत्र पडल्यामुळे त्या दोघांचा उद्धार झाला.
ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, “हे मूने, मी तुला भीम व्याधाची कथा सांगितली. त्यामध्ये वामनाचा उल्लेख आहे. आता त्याचे कथानक सांगतो.
श्री गणेश पुराण कथा (ब)*
*वामन अवतार*
हिरण्यकशिपुचा पुत्र प्रल्हाद. विरोचन हा प्रल्हादाचा पुत्र. त्याने सूर्याची आराधना केली. प्रसन्न झालेल्या सूर्याने त्याला एक दिव्य मुकुट दिला व म्हणाला, “विरोचना, जोपर्यंत हा मुकुट तुझ्या मस्तकावर आहे तोपर्यंत तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही.” या वरदानाचा व्हायचा तोच परिणाम झाला. उन्मत्त झालेल्या विरोचनाने नंतरच्या काळात आपल्या दुष्कृत्याने त्रिभुवनाला त्राही त्राही केले. तेव्हा भगवान विष्णूने एका दिव्य लावण्यवतीचे रूप घेऊन त्या दुष्टाला मोहित केले. एकदा स्नानाच्या वेळी त्याच्या अंगाला सुगंधी तेलाने मर्दन करीत असताना तिने अत्यंत लडिवाळपणे त्याला मुकुट बाजूला ठेवण्यास सांगितला. त्या वेळी त्याच्या मस्तकात तेल लावत असताना तिने मुष्टी ने प्रहार करून त्याला जागेवरच ठार केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बली दैत्यांचा राजा झाला.
एके दिवशी त्याने शुक्राचार्याला विचारले, “गुरुदेव, इंद्र हा आमचा भाऊबंद लागतो. पण तो एकटाच स्वर्गसुखाचा उपभोग घेतो, हे कसे? आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यासाठी मी स्वतः काय करावे? ते सांगा. शुक्राचार्य म्हणाले, “हे राजा, इंद्रपद मिळवण्यासाठी तुझ्या पूर्वजांनी अनंत प्रयत्न केले. पण कोणालाही यश आले नाही. तू स्वर्गाच्या राज्यासाठी युद्धादि मार्गांचा अवलंब करू नकोस. मी तुला एक सुलभ उपाय सांगतो. तू शंबर यज्ञ कर. त्या शतऋतूंच्या पुण्यप्रभावाने तुला इंद्रपद प्राप्त होईल.”
शुक्राचार्यांचे बोलणे ऐकून बळीच्या मनात उत्साह संचारला. त्याने भृगु, वशिष्ठ अशा सर्व श्रेष्ठ ऋषींना बोलावून घेतले. त्यांच्याशी विचारविमर्श केला. यज्ञांचा संकल्प करून त्याने विधिवत यज्ञदीक्षा घेतली. नंतरच्या काळात श्रेष्ठ ऋत्विजांच्या मार्गदर्शनानुसार त्याने एका मागोमाग एक याप्रमाणे नव्याण्णव यज्ञ पूर्ण केले. त्याने शंभरावा यज्ञ आरंभिला. तेव्हा देवांना मोठे संकट पडले. इंद्राला पदभ्रष्ट होण्याच्या भयाने ग्रासले. तो भगवान विष्णूंना शरण गेला. विष्णूने त्यांना अभय दिले.
कश्यप पत्नी आदितीच्या उदरात गर्भरूपाने विष्णू प्रविष्ट झाले. तिने एका तेजस्वी पुत्रास जन्म दिला. या नूतन बालकाचे कश्यपाने जातकर्म संस्कार केले. त्याचे ‘वामन’ असे नामकरण केले. यथावकाश त्याची मुंज केली. त्याला वेदविद्या शिकवली.एके दिवशी वामन कश्यपांना म्हणाला, “पिताश्री, देवकार्य हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. मला त्यांची चिंता व संकटे दूर करायचे आहेत.” कश्यप म्हणाले, “बाळा तू गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा जप कर. या मंत्रसाधनेने गणपती तुझ्यावर प्रसन्न होईल.”
काही दिवसांनी एका शुभमुहूर्तावर वामनाने आपल्या पित्याकडून मंत्रोपदेश घेतला. मग तो विदर्भात गेला. तो निराहार राहून गणपतीची भव्य आराधना करू लागला. त्यामुळे तो कृपाळू मंगलमूर्ती त्याला वर्षभरातच प्रसन्न झाला. त्यांनी वामनाला उद्दिष्टपूर्तीसाठी इष्ट वरदाने दिली. वामनाने त्या ठिकाणी एक सुंदर गणेश मंदिर बांधले. मग तो पितृगृही गेला.
सर्वप्रथम तो बलीच्या यज्ञमंडपात आला. कटीसूत्र, मेखला, कृष्णाजीन आणि दंड-कमंडलू धारण केलेली ती बटूवामनमूर्ती पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला. त्याच्या मुखावरील तपश्चर्येचे तेज आणि विलक्षण प्रसन्नता पाहून बलीला ही राहवले नाही. त्याने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. वामन म्हणाला, “हे दैत्यराज, मी अनाथ आहे. माझी तुझ्याकडून फार मोठी अपेक्षा नाही. तू मला तीन पावले टाकण्याची जमीन दिलीस तर मी पर्णकुटी बांधून राहील म्हणतो.” सर्व ऐश्वर्याने संपन्न झालेल्या बलीच्या दृष्टीने तीन पावले भूमिदान देणे ही अगदी क्षुल्लक गोष्ट होती.
त्याने बटूला तत्काळ होकार दिला. शुक्राचार्यांना विष्णूचे कपट लक्ष्यात आले. परंतु बळीने होकार दिल्यामुळे शुक्राचार्यांचा नाईलाज झाला. ते स्वस्थ बसले नाहीत. बळीने दानसंकल्प सोडण्यासाठी शेजारीच असलेली पाण्याची झारी आपल्या हाती घेतली. तेव्हा ते सूक्ष्म रूपाने झारीच्या तोटीत जाऊन बसले. त्यामुळे अवरोध उत्पन्न होऊन बटूच्या हातावर संकल्पाचे उदक पडेना. वामनाने शुक्राचार्याची युक्ती ओळखली. त्याने दर्भाची एक काडी झारीच्या तोटीत घातली. ती टोचल्यामुळे शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला. वेदना असह्य होऊन ते त्वरेने बाहेर आले. वामनाने उदकाची झारी बलीच्या हातात दिली. त्याने त्रिपाद भूमी दानाचा आपला संकल्प पूर्ण केला. तेव्हापासून शुक्राचार्य एकाक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले.
संकल्पाचे उदक हाती पडताच वामनाने व्यापकरूप धारण केले. त्याने एका पावलात भुलोक व्यापला, दुसरे पाऊल टाकून स्वर्ग व्यापला, मग त्याने तिसरे पाउल कुठे टाकू? अशी पृच्छा केली. बलीने स्वतःच्या मस्तकाकडे अंगुलीनिर्देश केला.वामनाने तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात दडपले. महाविष्णूच्या पावन पदस्पर्शाने बळी धन्य धन्य झाला. त्याच्या नव्याण्णव महायज्ञांची ती पुण्यवान फलश्रुतीच होती! वामनाने त्याला पाताळाचे अधिपती केले. वामनाने विदर्भ प्रांतात ज्या ठिकाणी मंत्रअनुष्ठान केले होते. तो परिसर अदोषनगर म्हणून प्रख्यात झाले.
श्री गणेश पुराण कथा (क)*
*मंदार आणि शमीका*
वीतीहोत्र नगरात एक वैदिक ब्राह्मण राहत असे. त्याचे नाव औरव. सुमेधा ही त्याची पत्नी. या दाम्पत्यास शमीका नावाची एक कन्या होती. ती सात वर्षांची झाली. तेव्हा त्याने तिच्यासाठी वरसंशोधन आरंभले. धौम्यपुत्र मंदार हा शौनक ऋषींपाशी विद्याभ्यास शिकत होता. तो अत्यंत ज्ञानी होता. औरवाने धौम्याची भेट घेऊन मंदारला शमिका देण्याचा विचार बोलून दाखविला. विवाहाची चर्चा यशस्वी होऊन विवाह संपन्न झाला. मंदार आणि शमिका आनंदाने संसार करू लागले.
एके दिवशी भृशुंडी ऋषी त्यांच्या आश्रमात गेले होते. त्यांच्या भ्रूमध्यातून निघालेली सोंड आणि त्यांची स्थूल देहयष्टी पाहून मंदार आणि शमिकाला हसू अनावर झाले. भृशुंडी ऋषींना क्रोध आला. त्यांनी त्या दोघांना शाप दिला, “तुम्ही माझ्या स्वरूपाला पाहून थट्टेने हसलात, या प्रमादाबद्दल तुम्ही उभयता वृक्ष व्हाल. पक्षीही तुम्हाला स्पर्श करणार नाहीत.” शापवाणी पूर्ण होताच मंदार मंदार वृक्ष आणि शमीकेचे शमी वृक्षात रूपांतर झाले.
या घटनेला महिना होऊन गेला. प्रिय शिष्य मंदाराची कोणतीही कुशलवार्ता कळली नाही, त्यामुळे शौनकांना मोठी चिंता उत्पन्न झाली. त्यांनी आंतरदृष्टीने अवलोकन केले असता सत्य प्रकार त्यांच्या ध्यानात आला. शमिका आणि मंदार यांना मुक्त करण्यासाठी शौनक ऋषी आणि औरव यांनी बारा वर्षे गणेश आराधना केली. त्यांच्या उत्कट तपश्चर्येने गणपती प्रसन्न झाले. त्यांनी दशभुजा स्वरूपात त्यांना दर्शन दिले. त्या दोघांनी त्याची मनोभावे स्तुती केली आणि मंदार व शमीका यांना वृक्ष योनीतून मुक्त करण्याची विनंती केली. गणपती म्हणाले, “भृशुंडी हा माझा श्रेष्ठ भक्त आहे. तो महातपस्वी आहे. त्याचे वचन मोडणे विधीला ही शक्य नाही, पण आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी मी नित्य वास्तव्य करीन असे वचन देतो. त्यामुळे तो त्रिखंडात पूज्य व पवित्र होईल. जो कोणी मंदार वृक्षाच्या खाली माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करील, दुर्वा आणि शमीपत्राने माझी पूजा करील, त्याच्या सर्व इष्ट कामना मी पूर्ण करीन. तेव्हापासून शमीपत्र गणपतीला अतिप्रिय झाली.
*ब्रह्मदेवांचा यज्ञ सावित्रीचा देवांना शाप*
फार पूर्वी सह्याद्री पर्वतात शंकराचा निवास होता. तेच स्थान महाबल क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. ब्रह्मदेवाने तेथे यज्ञ करण्याचे ठरविले. गायत्री व सावित्री आपल्या दोन भार्यासह ब्रह्मदेव तेथे आले. त्यांनी यज्ञाची सिद्धता केली. यज्ञ आरंभाच्या समयी सावित्री गृहकार्यात मग्न होती, म्हणून त्यांनी गायत्रीला बरोबर घेऊन यज्ञ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सावित्रीला फारच संताप आला. ती तावातावाने यज्ञ मंडपात आली व तेथील उपस्थितांना उद्देशून म्हणाली, “या मंगलप्रसंगी तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले. माझी येण्याची वाटही न पाहता यज्ञ आरंभ केला. हा माझा अपमान आहे. या प्रमादाचे फळं तुम्हाला भोगावेच लागेल. हा यज्ञ सिद्धीस जाणार नाही. तुम्ही सगळे जल व्हाल.”
सावित्रीची शापवाणी ऐकून निमंत्रित देव आणि अन्य मान्यवर भयभीत झाले. शापाचे संभावित परिणाम लक्ष्यात घेऊन देवांनी सह्याद्री पर्वतात उगम पावलेल्या नद्यांची रूपे घेतली. त्या समयी शिवपत्नी पार्वती, विष्णुपत्नी लक्ष्मी, सूर्यपत्नी छाया, इंद्रपत्नी इंद्राणी आदि देवस्त्रियांनी ब्रह्मदेवांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, “हे विधाता, तुम्ही सावित्रीचा मान ठेवला नाही. यज्ञआरंभी विघ्नहर्त्या गणेशाचे पूजन केले नाही. त्यामुळे पुढील अनर्थ घडला. आमच्या पतींना जलरूप प्राप्त झाले. आता या संकटाचे निवारणही तुम्हीच करा.”
ब्रह्मदेवाने देवस्त्रियांची कशीबशी समजूत काढली. त्यांना घेऊन ते कर्नाटकात गेले. तेथे एका पवित्र स्थानी असलेल्या मंदार वृक्षाखाली श्रीरामाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली होती. ब्रह्मदेवाने आणि देवस्त्रियांनी त्या मूर्तीची मनोभावे पूजा केली. गणेशाला शमीपत्र अर्पण केली. त्या सर्वांनी तेथेच राहून बराच काळ गणेश आराधना केली. प्रसन्न झालेल्या गणपतीने त्या सर्वांना चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिले. ब्रह्मदेवाने त्यांना आपले मनोगत सांगितले. गणपती म्हणाले, “हे विधी, सावित्री महासाध्वी आहे. तिचे शापवचन मी खोटे ठरवू शकत नाही. पण यापुढे नदीरूप झालेले देव अंशरूपाने नद्यांच्या आणि अंशरूपाने तरीही पूर्णस्वरूपात त्यांच्या स्त्रियांसमवेत राहतील, एवढी व्यवस्था मात्र करतो.” ते आशीर्वचन ऐकून देवस्त्रियांना फार आनंद झाला. शापग्रस्त देवही अंशरूपाने तेथे आले. त्यांनी गणपतीला वंदन केले. मग त्या सर्वांनी गणपतीची शमीपत्राने पूजा केली. त्या स्थानी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यास *हेरंब* हे नाव दिले. ब्रह्मदेवांनी तिथेच वास्तव्य करून बारा वर्ष तपश्चर्या केली. गजाननास प्रसन्न करून घेऊन त्यांनी यज्ञ समाप्ती केली. मग ते सत्यलोकी गेले.
श्री गणेश पुराण कथा (ड)*
*ढुंढिराज महात्म्य*
पूर्वी प्रियव्रत नामक एक राजा होऊन गेला. तो सत्यप्रिय, न्यायप्रिय व धर्मानुगामी होता. कीर्ती आणि प्रभा या त्याच्या भार्या. प्रभेपासून त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव पद्मनाभ. राजाचे प्रभा व पद्मनाभ यांच्यावर निरतिशय प्रेम होते. राजपुत्र वयात आल्यावर राजाने पांचाल देशाच्या राजकन्येशी त्याचा विवाह लावून दिला. राजाचा प्रभा राणीकडे जास्त ओढा असल्यामुळे सर्वत्र तिची सत्ता चाले. कीर्ती राणीच्या नशिबी मात्र कायम उपेक्षा आणि अवहेलना आली होती.
ती आपल्या मंदिरातच बराच वेळ रडत होती. मग तिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचे ठरवले. योगायोगाने त्याच वेळी देवक नामक राजपुरोहित काही कामानिमित्त तिला भेटण्यासाठी आले. राणीची अवस्था पाहून त्यांना फार वाईट वाटले. ते म्हणाले, “हे राणी, तु आत्महत्या करू नकोस. तु गणपतीला अनन्य भावाने शरण जा, त्याचे प्रेमपूर्वक आराधना कर. तुझे कल्याण होईल!” पुरोहिताच्या उपदेशाने कीर्ती राणीचे मन शांत झाले. तिने मंदार वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेली एक गणेशमूर्ती आपल्या देवघरात स्थापन केली. त्या मूर्तीला आपली व्यथा सांगितली. त्या मूर्तीची ती नेमाने पूजा, आराधना करू लागली.
ती गणपतीला दुर्वा अर्पण करीत असे. ज्येष्ठ मासातील एके दिवशी तिच्या दासीला कोठेही दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून तिने शमीपत्र आणली. राणीने ते शमीपत्र देवाला अर्पण केली व म्हणाली, “हे मंगलमूर्ती गजानना! दुर्वा उपलब्ध नसल्यामुळे मी अर्पण केलेल्या या शमीपत्रांचा तू स्वीकार कर. आजपासून पुढे जोपर्यंत दुर्वा मिळत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही.” त्या दिवशी संपूर्ण दिवस ती निराहारच राहिली. रात्र समयी गजाननाने तिला स्वप्नात दर्शन दिले. ते तिला म्हणाले, “शमीपत्रांनी पूजन केल्याने मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. तू राजाला प्रिय होशील. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.” त्या स्वप्नदृष्टांताने कीर्ती राणीचा आनंद गगनात मावेना. ती अधिक निष्ठेने गणेश आराधना करू लागली.
काही काळाने प्रभा राणीला कुष्ठरोग झाला. त्यामुळे तिला राजा टाळू लागला. तो कीर्तीच्या अधिक जवळ आला. तिच्याच सहवासात रमू लागला. अशाप्रकारे गजाननाच्या कृपेने तिला पतिसौख्य लाभले. मानसन्मान मिळू लागला. राजापासून तिला जो पुत्र झाला त्याचे नाव क्षिप्रप्रसादन ठेवण्यात आले. कीर्तीचे वाढते वैभव पाहून प्रभा दिवस-रात्र जळू लागली. आता तिचा मुलगाच आपल्या राज्याचा वारसदार होणार या विचाराने तिला रात्र रात्र झोप येईना. तिने कीर्तीच्या चार वर्षांच्या मुलावर दहीभातातून विषप्रयोग केला. तो तडफडून जागीच मरण पावला.
पुत्र निधनाने प्रियव्रत आणि कीर्तीला मोठा धक्का बसला. ती अनावर दुःखाने आक्रोश करू लागली. त्याच वेळी महान गणेशभक्त अशी त्रिखंडात ख्याती असलेले गृत्समद ऋषी तेथून कुठेतरी जात होते. त्यांनी कीर्ती राणीला पाहिले. तिची शोकग्रस्त अवस्था पाहून तेही गहिवरले. त्यांनी तिचे सांत्वन केले. मग ते म्हणाले, “हे राणी, धीर धर ! पूर्वी दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून तू शमीपत्रांनी गणपतीची पूजा केली होतीस, ते पुण्य तु या पुत्राला अर्पण कर. तो जिवंत होईल.” कीर्ती राणीला पूर्वीचा स्वप्नदृष्टांत आठवला. तिने गणपतीचे स्मरण केले. ऋषी वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून तिने शमीपत्र पूजनाचे पूण्यफल आपल्या पुत्राला संकल्पपूर्वक अर्पण केले. तर काय आश्चर्य! क्षिप्रप्रसादनाच्या निष्प्राण देहात पुनश्च प्राण संचार होऊन तो उठून बसला.
कीर्तीने गृस्त्मद ऋषींचे पाय धरले. ती गृस्तमदांना म्हणाली, “गणपतीला शमीपत्र अर्पण केल्याचे महात्मे किती थोर आहे, याचा मला आज प्रत्यय आला.” गृस्तमद म्हणाले, “शमीचे महात्म्य फार मोठे आहे. शमी या नावाचा नुसता उच्चार केल्याने मनुष्याच्या असंख्य पातकांचा नाश होतो.” कीर्ती राणी गृस्तमदांना म्हणाली, “महाराज माझा पुत्र लहान आहे. उपासनेच्या दृष्टीने त्याला सहज उच्चारता येईल असे एखादे गणेश नाम सांगण्याची कृपा करावी.” ऋषी म्हणाले, “गणपतीचे ‘गजानन’ हे नाव अतिशय सुलभ आहे. गणपतीच्या ढुंढि या नावाचेही महात्म्य फार थोर आहे. या संबंधित षडाननाने अगस्ती ऋषींना एक कथा सांगितली होती. तीच कथा मी तुला सांगतो, ती ऐक.
विधात्याच्या आज्ञेनुसार कश्यपाने चतुर्विध सृष्टी निर्माण केली. त्याच वेळी लोकांच्या उद्धारासाठी पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण केली. मोक्षदायक सप्तपुरांमध्ये काशी क्षेत्राचे स्थान फार वरचे आहे. हे क्षेत्र भगवान शंकरांनी स्वेच्छेने निर्माण केले आहे. येथे मृत होणाऱ्यांना अन्य गती नाही. त्या सर्वांना विश्वेश्वर मोक्ष देतात.
दुरासद भस्मासुराचा पुत्र. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून *नमः शिवाय* या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेतला. त्या मंत्राचे एकांत स्थानी हजारो वर्षे अनुष्ठान केले. प्रसन्न झालेल्या शंकराने त्यास दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले. तो म्हणाला, “हे महादेवा, मला मानव, प्राणी तसेच देव-दानव, यक्ष राक्षस यांच्यापैकी कोणाकडूनही मृत्यू येऊ नये.” तेव्हा शंकर म्हणाले, “शक्तीशिवाय अन्य कोणीही तुला मारू शकणार नाही.” शिवाच्या वरदानाने दूरासद फारच उन्मत झाला. त्याने आपल्या सामर्थ्याने त्रैलोक्यावर सत्ता प्रस्थापित केली. दुरासदाने भस्मासुराच्या मुकुंदपुरासच आपली राजधानी केली आणि त्रीखंडावर निरंकुश सत्ता गाजवू लागला.
एके दिवशी दूरासद राज्यसभेत बसला होता. तो प्रधानांना म्हणाला, “मी स्वर्ग व पाताळासह नवखंड पृथ्वी जिंकली. पण दहावे खंड म्हणून प्रख्यात असलेली वाराणसी अजूनही माझ्या ताब्यात नाही.” प्रधानाला त्याचा हेतू कळला. त्याने दैत्यसेनेला युद्धसिद्धतेचे आदेश केले. दुरासदाने काशी वर आक्रमण केले. सर्व देवांनी भवानीची व गजाननाची स्तुती केली. दूरासदरुपी संकटातून सोडविण्याची त्या दोघांना आर्ततेने प्रार्थना केली. देवांनी सर्व वृत्तांत पार्वतीला कथन केला.
दुरासदाच्या अत्याचारांविषयी ऐकून ती महादेवी अतिशय संतप्त झाली. तिच्या डोळ्यातून आणि श्वासोच्छवासातून दिव्य तसेच भयंकर उग्र तेज बाहेर पडू लागले. त्या तेजाचे पूर्ण आविर्भवन झाले तेव्हा देवांना त्यामध्ये दोन दातांसह शुंडादंडाने युक्त अशी अत्यंत तेजस्वी गजमुख मूर्ती दिसून आली. देवांनी त्याची स्तुति केली. त्याला *वक्रतुंड* या नावाने संबोधले. वक्रतुंडा ने सर्व देवांना धीर दिला. हाती भयंकर शस्त्रास्त्रे घेऊन तो सिंहारूढ झाला.
त्याने दुरासदाला ललकारले, तेव्हा तोही शस्त्रसज्ज होऊन युद्धास ठाकला. मग सुरू झाले एकच भयंकर रणकंदन! वक्रतुंडाने आपल्या परशूने त्या महादैत्यावर तीव्र हल्ला चढविला. संतप्त झालेल्या दुरासदाने गणपतीला द्वंद युद्धाचे आव्हान दिले. दोघेही एकमेकांना भिडले. त्या मल्लयुद्धात गजाननाने दुरासदाच्या तोंडावर जोराने मुष्टीप्रहार केला. तो आघात असह्य होऊन तो मूर्च्छित पडला. तो भानावर आला तेव्हा सायंकाळ झाली होती. युद्ध थांबून दोघेही वीर आपापल्या शिबिरात परतले.
दुसरा दिवस उजाडला. दुरासदा आणि गणपती यांच्यात भीषण अस्त्रयुद्ध झाले. ‘शक्तीपासून उत्पन्न झालेला कोणी विरच तुला परास्त करील’ या शिव वचनांचे त्याला वारंवार स्मरण होऊ लागले. वक्रतुंड हा शक्तीचा पुत्र आहे, त्याच्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याच वेळी गजानन विराट रूप धारण करून त्याच्या सन्मुख प्रकट झाले. त्याने दुरासदाची शेंडी धरली. एक पाय काशीमध्ये आणि दुसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून मोठ्याने गर्जना करीत तो म्हणाला, “दुष्टा, भगवान शंकराच्या वरप्रसादाने तुला मृत्यू येणार नाही हे जरी खरे असले, तरी पर्वताच्या रूपाने तु या क्षेत्राजवळ पडून राहा. या स्थानाचे सदोदित रक्षण कर.”
तेव्हा गणपतीच्या पावन पदस्पर्शाने दुरासदाचा दैत्यभाव मावळला. तो विनम्र वाणीने म्हणाला, “हे गजानना, हे शक्तीसुता ! माझ्या मस्तकावर पाय ठेवून तू निरंतर असाच उभा राहणार असशील तर मी ही आनंदाने पर्वत रूपाने येथे पडून राहिल.” ही त्याची विनंती गणपतीने तात्काळ मान्य केली. दुरासदाने पर्वताचे रूप घेतले आणि गजाननाने त्यावर वास केला.
दुरासदाच्या उपद्रवापासून सुटका झाल्यामुळे त्रिखंड आनंदित झाले. देवांनी आणि ऋषी जणांनी गणपतीची अपार स्तुती केली. ते म्हणाले, “हे पार्वतीनंदना! हे देवादीदेव गणराया ! देव आपल्यापेक्षा वेगळा आहे असे समजून सर्व जण तुला बाहेर धुंडीत असतात म्हणून तू ढुंढिराज म्हणून ओळखला जाशील. तुझ्या दर्शनाने, पूजनाने व स्मरणाने भक्तांचे कल्याण होईल. त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतील.” त्यानंतर सर्व देवांनी आणि ऋषींनी मंदारपुष्पे आणि शमीपत्र अर्पण करून गजाननाची मनोभावे पूजा केली. त्याने लोककल्याणार्थ काशीमध्ये वास करावा अशी प्रार्थना केली. त्यांच्या विनंतीवरून ढुंढिविनायकाने आपल्या छपन्न विभूतींसह वाराणसीत वास्तव्य केले.
गृस्तमद ऋषी कीर्ती राणीला पुढे म्हणाले, “हे राणी ! तुझा पुत्र क्षिप्रप्रसादन याने उपासनेसाठी गणपतीचे ढुंढिराज हे नाव घ्यावे असे मला वाटते. हे नाम घेतल्याने त्याचे कल्याण होईल. तो ज्ञानी, सद्गुणी आणि पराक्रमी होईल.
*🔸प्रदोष.🔸*
*द्वादशी संपल्यावर जी रात्र येते त्याला प्रदोष म्हणतात... (दोन्ही पक्षा मध्ये)*
*प्रदोष चार प्रकारचे असतात...*
*१. सोम प्रदोष- सोमवारी येणारा प्रदोष...*
*२. भौम प्रदोष- मंगळवारी येणारा प्रदोष...*
*३. शनी प्रदोष- शनीवारी येणारा प्रदोष...*
*४. पक्ष प्रदोष- इतर वारी येणारा प्रदोष...*
*या सर्वांमध्ये पक्ष प्रदोष हा अधिक महत्त्वाचा आहे...*
*प्रदोष या शब्दाचा अर्थ पहाता प्र म्हणजे प्रकर्षण युक्त, अतिशय लक्षणीय, व दोष म्हणजे दुर्गुण, पाप होय... म्हणजेच ज्यावेळेस एखादा दोष किंवा पाप अतिशय प्रखर असते, त्यावेळेस त्याची गणना प्रदोषात होते. अशा वेळी तो दोष जाण्यासाठी तितकीच प्रभावी उपाय योजना करणे महत्त्वाचे असते.....*
*म्हणून त्यासाठी प्रदोष व्रत हा एक अतिशय खात्रीशीर उपाय आहे...*
*१. सोम प्रदोष- पारमार्थिक, अध्यात्मिक,आणि पार लौकिक श्रेय प्राप्त करण्यासाठी हे व्रत करतात.....*
*२. भौम प्रदोष- आर्थिक समस्या,ऐहिक स्थिती सुधारण्यासाठी हे व्रत करतात.....*
*३. शनी प्रदोष- संतती विषयक सर्व समस्या सुटण्यासाठी हे व्रत करतात.....*
*४. पक्ष प्रदोष- हा सर्व समावेशक आहे.हे व्रत केल्यामुळे मानवाच्या धनधान्य, पुत्रपोत्रादीं समस्या, अनेक ऐहिक कामना पूर्ण होतातच पण मुक्तीसाठी आवश्यक ती भक्ती, साधना, साक्षात्कार याही गोष्टी या व्रतमुळे साध्य होतात... शिवाय कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक इ.अनेक प्रकारची दुरीते या व्रत मुळे समूळ नष्ट होतातच पण विविध प्रकारच्या सिद्धी या मुळे प्राप्त होतात.....*
*प्रदोष व्रताचे महत्व व पद्धत सोदाहरण वेदतुल्य श्री गुरु चरित्र या महान ग्रंथात दिलेले आहे... श्रद्धा, भक्तिभाव, नियमितता यामुळे अमूल्य असे फळ या व्रताने मिळते. केलेली सेवा निष्ठा वाया जात नाही .फक्त श्रध्देबरोबर सबुरी हवी...*
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
गृत्समद ऋषींनी कीर्ती राणीला गणपतीच्या अनेक कथा सांगितल्या. तिला कल्याणप्रद अशिर्वाद देऊन ते निघून गेले. मग ती पुत्रासह काशीक्षेत्री गेली. तिथे ढुंढीराजाचे दर्शन घेतले. त्या विनायकाची दूर्वा आणि शमीपत्रांनी पूजा केली. आपल्या पुत्राला त्यांच्या चरणावर घातले. त्यांची भक्तीभावाने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतीने सगुण-साकार रूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले. त्यानंतर तिच्या पुत्राला परशु देऊन त्याला परशुबाहू या नावाने संबोधिले. गणपतीने आपला परशु क्षिप्रप्रसादनाच्या हाती दिला आणि तो अंतर्धान पावला. कीर्ती राणी स्वस्थानी परतली. त्या दोघांचे लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. क्षिप्रप्रसादनाने राज्याची धुरा समर्थपणे हाताळली. त्यानंतर त्याने आपल्या सद्गुणांनी सर्वांची मने जिंकून न्याय, नीती, धर्माने सहस्त्र वर्षे उत्तम राज्य कारभार करून तो अंती गणेशलोकी निघून गेला.
*नरांतकाचा वध*
आपल्या अनेक बलाढ्य दैत्यांच्या महोत्कटाने वध केला म्हणून नरांतक अक्षरश: जळतफळत होता. त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे ठरविले. शूर आणि चपल या दोन सहकाऱ्यांना कामगिरीवर पाठवले. महोत्कट शुक्ल ब्राह्मणाकडून प्रासादाकडे जात असताना त्यांनी पालखीवर हल्ला केला. तेव्हा महोत्कटाने दैत्यांना चांगलेच बदडून काढले. त्या दोघांना आपटून ठार मारण्याचे ठरविले. शूर आणि चपल रडत तेथून पळून गेले. त्यांनी नरांतकापाशी जाऊन सर्व वृत्तांत कथन केला. त्यांची अवस्था पाहून दैत्यराज बिथरला.
महोत्कट आणि काशीराजा यांचा सूड उगवायचा असा निश्चय करून त्याने त्वरेने आदेश दिले. महाबलाढ्य सेना घेऊन तो काशीवर चाल करून गेला. नरांतकाने काशी नगराला वेढा घातला हे वृत्त कळताच राजाने हे युद्धसिद्धता केली. आपल्या सेनापतीला व सैनिकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले. संरक्षक व्यूहरचना केली. त्यानंतर त्याने गणपतीची पूजा केली. महोत्कट आपला पाठिराखा आहे, असल्या हजारो संकटाचा नाश करील अशी त्याची पूर्ण श्रद्धा होती. शत्रूचा निःपात करण्यासाठी तो घोड्यावर स्वार होऊन निघाला.
नरांतकाच्या सैन्याने तटबंदीवर प्रखर हल्ला चढविला. आता युद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हता. राजाने तातडीने प्रतिकाराचे आदेश दिले. काशीच्या सैनिकांनी दैत्यसैन्यावर त्वेषाने हल्ला केला. उभयपक्षी युद्धाला तोंड लागले. भयंकर रणधुमाळी माजली. राजाला भान राहिले नाही. शत्रूचा प्रतिकार मोडीत तो आत घुसला. याच संधीचा फायदा घेऊन दैत्यवीरांनी त्याला चहूकडून घेरले आणि शस्त्र ठेवण्यास भाग पाडले. त्यांनी काशीराजाला कैद करून नरांतकाच्या समोर उभे केले.दैत्यराजाने काशीराजाला आपल्या रथात घातले आणि नगराकडे निघाला.
नरांतकाने काशीराजाला धरून नेले या वृत्ताने संपूर्ण नगरीत एकच हाहाकार माजला. लोक चिंताग्रस्त होऊन आक्रोश करू लागले. त्या आणीबाणीच्या प्रसंगी महोत्कटाने राणीची त्वरित भेट घेतली. तिला धीर दिला. तिचे सांत्वन करून तो त्वरेने प्रासादाबाहेर आला. प्रांगणामध्ये येऊन त्याने प्रचंड गर्जना केली आणि आपल्या सिद्दींच्या सामर्थ्याने अफाट सैन्य उत्पन्न केले. मग एक अक्राळविक्राळ कालपुरुष निर्माण केला. त्याला त्या सेनेचे अधिपत्य करावयास सांगितले. कालपुरूष महाभयंकर गर्जना करीत प्रचंड सैन्यानिशी नरांतकावर चाल करून गेला. त्याने राक्षसांचे समूहाच्या समूह तोंडात टाकले, त्यांना दाढेखाली रगडून गिळून टाकले.
त्यानंतर नरांतकाची मानगूट धरली आणि त्याला फरफटत महोत्कटासमोर आणून टाकला. महोत्कटाने आपला जबडा उघडला, त्यामार्गे कालपुरुष सूक्ष्मरूपाने त्याच्या उदरात प्रवेशला. कालपुरुषाने दैत्यसेनेचा ग्रास केला, तेव्हा काशीराजालाही गिळून टाकले होते. त्याने महोत्कटाच्या उदरात प्रवेश केल्यावर काशीराजाही तेथे गेला. राजाला तेथे अनंत ब्रम्हांडे दिसू लागली. हा काय प्रकार आहे हे त्याला समजेना. महोत्कटाला काशीराजा कुठेच दिसला नाही. त्याने आंतरदृष्टीने त्याचा सर्वत्र शोध घेतला. तो आपल्या शरीरात आहे हे त्याच्या तत्काळ लक्षात आले. मग त्याला विनायकाच्या रोमरंध्रातून बाहेर काढले. हे स्वप्न आहे की सत्य हेच राजाला कळेना. त्याने महोत्कटाला दुरूनच नमस्कार केला. मग तो राणीच्या मंदिरात प्रवेशला. आपल्या पतीला सुखरूप परत आलेला पाहून तिचा आनंद गगनात मावेना.
नरांतक फारच आश्चर्यचकित झाला. त्याने प्रचंड गर्जना करून महोत्कटावर चढाई केली. महोत्कटाने धनुष्य हाती घेतले. भात्यातील एक तीक्ष्ण बाणावर भयंकर दाहक अस्त्राची योजना करून त्याने अचूक शरसंधान केले. त्या बाणाने नरांतकाचे दोन्ही हात छेदले. महोत्कटाने तीव्र गतीने अभिमंत्रित बाण सोडून त्याचे दोन्ही पाय व मस्तक छेदले. त्यानंतर महोत्कटाने एकदम विराटरूप धारण केले आणि त्या दुष्टाला अंगठ्याने चिरडून टाकले. नरांतकाचा अंत झाला! त्रिभुवनावरचे मोठे संकट टळले. सृष्टीने नि:श्वास टाकला. देवांनी महोत्कटावर आनंदाने पुष्पवृष्टी केली.
श्री गणेश पुराण कथा (ब)*
*देवांतकाचा वध*
नरांतकाच्या निधनामुळे देवांतकाला फार दुःख झाले. तेव्हा राक्षसांचा संहारास कश्यपपुत्र महोत्कटच जबाबदार आहे, हे त्याच्या लक्षात आले. तो संतापाने बेभान झाला. ‘जोपर्यंत महोत्कटाचा वध करीत नाही, तोपर्यंत नरांतकाची उत्तरक्रिया करणार नाही’ अशी भीषण प्रतिज्ञा करून त्याने आपल्या सैन्यासह आकाशात उड्डाण केले. त्याने त्वरेने काशी गाठली. हे वृत्त समजताच काशीराजा फारच भयभीत झाला. तो त्वरेने अंगणात खेळणाऱ्या महोत्कटापाशी गेला. काशीराजाची विनंती ऐकुन महोत्कटाने त्याला अभय दिले.
दुसऱ्या क्षणी त्या लिलाविग्रही अवतारी गणेशाने आपले बालरूप टाकून सिंहारूढ असे अतिविशाल रौद्ररूप धारण केले. त्याने सिद्धी-बुद्धीला सर्व सामर्थ्यानिशी प्रकट होण्यास सांगितले. त्याबरोबर अणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या वशित्व आणि ईशीत्व या अष्टमहासिद्धी त्याच्या अंगात प्रविष्ट झाल्या. महापराक्रमी सेनाही प्रकट झाली. त्या सेनेसह महोत्कटाने देवांतकाच्या सैन्यावर चढाई केली. तेव्हा देवांतकाने दैत्य गुरु शुक्राचार्य ची मदत घेतली. महोत्कटाने सिद्धयोगाने एक महाभयंकर कृत्या उत्पन्न केली. तिने देवांतकाच्या सैन्यात घुसून प्रचंड उत्पात घडविला आणि शुक्राचार्यांना दूर बर्बर देशात भिरकावले.
हे युद्ध तीन दिवस रात्र अखंड चालले होते. देवांतकाने निर्णायक युद्ध करण्याचा निश्चय केला. त्याने महोत्कटाच्या सैन्याच्या व्यूहरचना फोडून प्रचंड कत्तल केली. हा सर्व प्रकार पाहून बुद्धी महोत्कटास म्हणाली, “हे प्रभू, आता मला अनुज्ञा द्या.” विनायकाची संमती मिळताच बुद्धीने राक्षसांकडे पाहून आव्हानात्मक प्रचंड गर्जना केली. तिला रोखण्यासाठी देवांतकाने शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. देवांतकाने संधी साधून तेथून पळ काढला. तो कसाबसा पित्याच्या घरी आला. त्याने रौद्रकेतुला आपल्या पराभवाचे वृत्त सांगितले. त्याने देवांतकाला धीर दिला आणि युद्धात यशस्वी होण्यासाठी शिव अनुष्ठान करण्यास सांगितले.
शिवमहामंत्राचा उच्चार करून ते दोघे प्रदीप्त अग्नीमध्ये हविर्द्रव्यांनी विधिवत हवन करु लागले. होमविधी संपन्न झाल्यावर रौद्रकेतूने देवांतकाला बळी दिले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला पुन्हा जिवंत केले. महादेवाच्या वरदानाने देवांतकाने प्रचंड गर्जना करून महोत्कटास युद्धाचे आव्हान दिले. तोही तयारीतच होता. बघता बघता दोन्हीकडचे वीर परस्परांवर धावून गेले. तुंबळ रणकंदन माजले. महोत्कटाने प्रलयकारी मेघाच्या गडगडाटाप्रमाणे प्रचंड गर्जना केली. तो देवांतकास म्हणाला, “मुढा, तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझा मृत्यू निश्चित आहे.”
देवांतकानेही त्याला प्रतिआव्हाने दिली. मग ते दोघे एकमेकांवर तुटून पडले. तो सर्व प्रकार पाहून चवताळलेल्या देवांतकाने महोत्कटावर प्रचंड शरवर्षाव केला. त्यातून काहीच साध्य झाले नाही. शंकराच्या वरदानानुसार देवांतकाचा वध दिवसा किंवा रात्री करता येणे शक्य नाही, त्यासाठी संधीकालच उपयुक्त आहे हे महोत्कटाच्या लक्षात आले. महोत्कटाने दुसऱ्या दिवशी पहाटेच युद्धात जाण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास विनायकाने सैन्यावर अचानक हल्ला केला. त्या वीरांना धराशायी करित तो देवांतकच्या शिबिरात प्रवेशला.
त्याने अर्धवट झोपेत असलेल्या त्या दुष्ट दैत्याला आपल्या मांडीवर घेतले. त्याही परिस्थितीत देवांतकाने जोरदार प्रतिकार केला. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने विनायकाच्या एका दाताला जोराने धक्का दिला. तो दात अर्धवट तुटून खाली पडला. त्याबरोबर तो दैत्यही खाली आदळला. संतापलेल्या महोत्कटाने कसलाही विचार न करता त्या तीक्ष्ण दाताने शतप्रहार करून त्याचे मस्तक विदीर्ण केले. देवांतकाचा वध झाला. त्याची प्राणज्योत महोत्कटाच्या शरीरात विलीन झाली. देवांतकाचे आतंक संपले होते.
महोत्कटाच्या या विजयाने त्रिभुवनात आनंदाला उधाण आले. सर्वत्र त्याचा जयजयकार दुमदुमला. त्यास *उपेंद्र* या नावाने सन्मानित केले. पृथ्वीवरील राजांनी *ऋषिकेश* या संबोधनाने त्यांची अपार स्तुती केली. आपल्या नगरी वरचे महान संकट टळले म्हणून काशीराजाचा जीव भांड्यात पडला. तो तत्परतेने महोत्कटाच्या भेटीस आला. काशीराजाने त्याला वाजत-गाजत मिरवणुकीने नगरात आणले. नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
राजाच्या ज्योतिषांनी शुभमुहूर्त काढला. निमंत्रणे पाठवण्यात आली. महोत्कटाने नरांतक-देवांतक यांच्यासह असंख्य दुष्ट दैत्यांना मारून जगावर उपकार केले होते, त्यामुळे विवाहप्रसंगी त्याचेही दर्शन होईल या उद्देशाने सर्व मंडळी बहुसंख्येने आली होती. राजपुत्राचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. काशीराजाने निमंत्रितांचा सत्कार केला. सर्व कार्य पूर्ण झाल्यावर राजाने महोत्कटाच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले. त्याला दिव्य वस्त्रअलंकार देऊन गौरविले. द्रव्य दिले.
राजाने त्याला स्वर्ण रथातून कश्यप यांच्या आश्रमात नेण्याचे ठरविले. त्याला निरोप देण्यासाठी काशीतील सर्व मान्यवर नगरवेशीपर्यंत आले होते. महोत्कटाला घेऊन काशीराजा कश्यप यांच्या आश्रमात गेला. कश्यप आणि आदितीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर बराच कालावधी लोटला. महोत्कटाने आपल्या मातापित्याकडे जाण्याची अनुज्ञा मागितली. त्याचे मनोगत जाणून कश्यप आणि आदितीला फारच दुःख झाले. त्याला थांबवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. त्यांना वंदन करून महोत्कट अंतर्धान पावला. कश्यपांनी त्या ठिकाणी विनायकाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून एक सुंदर मंदिर बांधले. नंतरच्या काळात विनायकाने आपल्या मातापित्यांना अनेकदा दर्शन देऊन त्यांचे समाधान केले.
*कोकणात गौरी मातेला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो का.???*
नैवेद्य हा मटणाचा असतो पण हे गौरी माते साठी नाही! गौरी माऊली साठी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो..
आणि जो मांसाहार नैवेद्य दाखवला जातो तो महादेवाच्या गणाला दाखवला जातो...
पोस्ट आणि कमेंट वाचून कळतं की बऱ्याच जणांना नैवेद्द कोणाला दाखवला जातो हे माहीत नसावं गौरी मातेला मांसाहाराचा नैवेद्द बनवतो असे म्हणणे चुकीचे ठरेल ..आणि समाजामध्ये थट्टा मस्करी करणारे बरेच आहेत म्हणतील काय तुम्ही एवढा गणपती पूजता आणि गौरी दिवशी मांसाहार करता म्हणून ह्या प्रथा मागचे खरे कारण सर्वांना समजले पाहिजे..
गौरी माता म्हणजेच माता पार्वती गणपती बाप्पा ची आई यांना नैवेद्य हा नेहमी गोड बनवला जातो पण पुराणामध्ये असे आहे की ज्या दिवशी गौरी मातेचे आगमन झाले होते तेव्हा बरेच गण म्हणजे महादेवाचे गण त्या मध्ये भूत ,राक्षस ,असुर हे सगळेच आले कारण महादेव हे भूतनाथ पण आहेत म्हणून त्यांना महादेवाचे गण असे संबोधले जाते.. हे सर्व गण गौरी माते सोबत तिला सोडायला आले होते आणि गौरी मातेला त्यांना भोजना शिवाय जाऊ दयायचे न्हवते म्हणून गौरी मातेने त्यांच्या साठी मांसाहार चा वेगळा नैवेद्य केला गणांसाठी
आणि त्या पासून ही पुढे प्रथा चालू झाली आहे आणि मान्यता आहे ...
वरील माहिती ही गावी असलेल्या वयस्कर आज्या ह्यांकडून ऐकली होती...
काही चुकीचे असल्यास त्या बद्दल माफी असावी आणि ह्या प्रथे बद्दल आणि कोणाला जास्त माहिती असेल तर नक्की शेअर करावी जेणेकरून गणेशोत्सव आणि त्या मागच्या काही प्रथांचा कारण सर्वांना समजण्यास मदत होईल..👍
माझे उद्दिष्ट एवढेच आहे की चुकीचा समज बाकी लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून एक छोटासा प्रयत्न..
*खड्याच्या गौरी*
कोकणस्थांमध्ये खड्याच्या गौरी आणायची पद्धत आहे. पाणवठ्यावरून सात खडे वेचून घेतात. काहीजणांकडे यापेक्षा कमी-अधिक संख्येत खडे असू शकतात. त्यातील एक जेष्ठगौर आणि एक कानिष्ट्गौर आणि बाकीच्या सख्या म्हणून त्याची स्थापना करतात. पाणवठ्यावर एखादी जागा स्वच्छ करून तिथे या गौरी ठेवून त्याची पूजा व आरती करतात. त्यांना प्रसाद दाखवला जातो. यानंतर गौरी आणणारी जी माहेरवाशीण असेल तिने तोंडात पाण्याची चूळ भरून रस्ताभर ती चूळ ना टाकता मुक्या तोंडाने गौरी घरात आणायच्या असतात. गौरीला दारातून आत हळदीची म्हणजे सोनपावलांनी घेवून येतात. गौरी आणणा-या मुलीने याच पावलांवर पाय ठेवून आत यायचे असते.
दुसऱ्या दिवशी गौरी-पूजनाला गौरीला घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला जातो. विसर्जनाच्या दिवशी नैवेद्याला खीर-पुरी असते. जाताना रांगोळी म्हणजे रुप्याची पाउले रेखाटतात. गौरीच्या बरोबर दुपारच्या नैवेद्याची शिदोरी किंवा दहीपोह्यांची शिदोरी दिली जाते. जातानाही मुकेपणानेच गौरी विसर्जन केले जाते पाणवठ्यावर जाऊन तिथे पुन्हा एकदा आरती करून वाहत्या पाण्यात गौरी वाहवल्या जातात.
- प्रसन्न खरे
(सध्या असे गौरीच्या मुखवट्यासारखे रंगवलेले खडे मिळतात.)
*गौरी गणपती*
भाद्रपद महिन्यात गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हिंदू महिलांचा एक महत्त्वाचा व्रत मानला जातो. गौरी पूजन हा देखील महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे. त्याला महालक्ष्मी पूजा देखील म्हटले जाते.
गौरी या शब्दाचा अर्थ काय आहे ?
संस्कृत शब्दकोषानुसार, ‘गौरी’ म्हणजे आठ वर्षाची पवित्र मुलगी असे होय. तसेच गौरीचा अर्थ पार्वती, पृथ्वी, वरुणची पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जचीची द्राक्षांचा वेल शब्दकोशातही तुम्हाला पाहण्यास मिळेल. याच आधारावर तेर्य फुलाची पूजा गौरी म्हणून करण्यात येते, लक्ष्मी विष्णूची पत्नी आणि महालक्ष्मी महादेव, पार्वती यांची पत्नी. जेश्ठा गौरी यांना ओळखले जाते.
गौरी गणपती उपवास स्वरूप :-
भाद्रपद महिन्यात अनुराधा तिच्या सद्गुण स्वभावाप्रमाणे नक्षत्रात महालक्ष्मी / गौरीची चित्रे किंवा चिन्हे ठेवली जातात. वडील नक्षत्रात महालक्ष्मीची पूजा करत असतात आणि महानैवेद्य दाखवले जाते. तिसर्या दिवशी ते मूल नक्षत्रात महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. गौरीला महालक्ष्मी हि म्हटले जाते आणि ज्येष्ठ नक्षत्र म्हणून पूजले जाते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी असे हि संबोधले जाते.
गौरी गणपतीचा इतिहास :-
हिंदू धर्मशास्त्रात तसेच सामाजिक जीवनात गौरीला शिवशक्ती आणि गनपती बाप्पांची माता मानले जाते. द्वादशगौरीचा उल्लेख अपराजितप्राचीन पुस्तकात करण्यात आला आहे. अग्नि पुराणात असे म्हटले आहे की, गौरीच्या मूर्तीची एकत्रित पूजा केली जात असे. लातूरमधील नीलकंठेश्वर मंदिरात शिव आणि गौरीच्या प्रतिमा कोरल्यात आले आहे. एक पाय विंचू त्याच्या पायांनी दर्शवण्यात आला आहे.
गौरीने आपल्या डाव्या हातात बियाणे परिशिष्ट ठेवले आहे, तिच्या केसांवर फुलांचे वेणी हि पाहण्यास मिळेल. ती शिव घराण्यातील देवता असून कानौजमध्ये त्यांचे मंदिर हि पाहण्यास मिळेल. एकदा भुतांनी कंटाळलेल्या सर्व स्त्रिया गौरीकडे गेल्या आणि त्यांचे नशिब अबाधित व्हावे म्हणून तिला प्रार्थना केली होती.
गौरी गणपतीचे महत्त्व :-
गौरी गणपतींचा सण कुलचराच्या रूपात सर्व जाती व जमाती संपूर्णपणे साजरा करतात. ज्या घरांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे तेथे महिला धान्य देऊन उपासना करण्यात येते. लक्ष्मी किंवा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी जमीन समृद्ध करण्यासाठी धान्य लक्ष्मीची पूजा करणे हा मूळ हेतू असतो.
गौरीचे पूजा घालण्याचे वेगवेगळे मार्ग :-
गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा जागोजागी बदलत चालली आहे. काही कुटुंबांमध्ये गौरी मुखवटा आहेत, तर काही पारंपारिकपणे जलाशयात जातात आणि पाच, सात किंवा अकरा दगड घेऊन त्यांची पूजा करण्यात येते. कुठेतरी पाच भांडी उतार आहेत आणि त्यावर गौरी मुखवटे लावले जातात. काही घरांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळी इत्यादी धान्याच्या ढीग साचलेल्या असतात आणि झाकलेले असतात. बाजारात शीट मेटल, लोखंडी सळ्या किंवा सिमेंटची पत्रके उपलब्ध आहेत.
त्याने तिच्यावर मास्क लावला आणि बॅगवर साडी ठेवली. सुपाट धान्य साठवतो आणि त्यावर एक मुखवटा ठेवतो. किंवा गहू आणि तांदूळांनी भरलेल्या तांबेवर मुखवटा घालून पूजा करा. आपले लक्ष देखील लक्षात येते. तेराडाची झाडे मुळे आहेत. ही मुळे गौरीच्या पायर्या असल्याचे मानले जाते. आधुनिक काळात गौरीची उपासना आणि व्यवस्था करण्याच्या पद्धतीत आणि गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते.
अनेक घरात अनेक प्रकारात गौरी / महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ काळ साजरा केला जातो आणि मुखवटे आणि लक्ष्मीच्या हाताची पूजा केली जाते. त्या रात्री गौरीचे संगोपन होते. या गौरी / महालक्ष्मी किंवा सखी-पार्वती सोबत त्यांची मुले (एक मुलगा आणि मुलगी) देखील उपस्थित आहेत. काही लक्ष्मीची मूर्ती बनवून धातूची पूजा करतात, काही मातीची तर काही कागदाच्या तुकड्यावर देवीची प्रतिमा बनवतात.
गौरी पूजन (पहिला दिवस) :-
त्यांच्या परंपरेनुसार जेव्हा तिला घराच्या दारातून आणले जाते तेव्हा तिच्या हातात गौरी असलेल्या महिलेचे पाय दूध आणि पाण्याने धुतले जातात आणि तिच्यावर कुमकुम स्वस्तिक ओढले जाते. घराच्या दारापासून गौरीची स्थापना करायच्या ठिकाणी ते गौरीचे मुखवटे लक्ष्मीच्या पायाचे ठसे घेतात. त्यावेळी डिश चमच्याने किंवा बेलने वाजवले जाते. यानंतर त्यांना स्थापित होण्यापूर्वी त्यांना घर, दुधाचे ठिकाण इत्यादिची भरभराट केली गेली.
गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांनी आशिर्वाद देऊन ऐश्वर्या नंदोसाठी प्रार्थना केली. पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी, गौरीला भाजीपाला आणि रोटीचा एक डिश काही भागात, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात दर्शविला जातो. या प्रथेला गौरी अपील म्हणतात.
गौरी पूजन (दिवस 2) :-
दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रात गौरीची पूजा केली जाते. सकाळी गौरी / महालक्ष्मी पूजा-आरती केल्यावर फरला (रेव्ही लड्डू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुलपापडी लड्डू) चा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर संध्याकाळी आरती करावी. प्रसादात पूरनपोली, ज्वारीच्या पीठाची अंबिल, भांग भाजी, सोळा भाज्या एकत्र, दिवा इत्यादींचा समावेश आहे.
शेंगदाणा आणि मसूरची चटणी, पंखृत, टाकवाल भाजीसह पडवळ, चिरलेली आमटी, विविध प्रकारच्या भाज्या, पापड, लोणचे इत्यादी अर्पण करतात. केळीच्या पानावर सर्व साहित्य ठेवा. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज संध्याकाळी महिलांच्या हळदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महिला व मुलींचे आदराने स्वागत करण्याची प्रथा प्रचलित आहे.
विसर्जन (3 दिवस) :-
तिसर्या दिवशी ते मूल नक्षत्रात गौरी / महालक्ष्मीचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी ते कापसाचे गाठ बांधतात. सूतमध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळला जातो. यात हळद, रेशीम धागा, झेंडूची पाने, काजूची फुले यांचा समावेश आहे. त्यानंतर ते गौरी / महालक्ष्मीची पूजा करतात आणि आरती करतात. गोड शेवय खीर, उडीद डाळचा भाजलेला पापड अर्पण केला जातो.
या तिसर्या दिवशी गौरी / महालक्ष्मीच्या चेहर्यावर एक प्रकारची उदासीनता येते. गौरीची पूजा केली जाते, आरतीला आमंत्रित केले जाते आणि पुढच्या वर्षी येण्यास आमंत्रित केले जाते आणि तिचे विसर्जन केले जाते (जर तेथे धातू किंवा कायमस्वरुपी मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन केले जात नाही.) ते झाडांवर ठेवा. असा विश्वास आहे की हे घरात समृद्धी आणते आणि वनस्पतींना कीटकांपासून संरक्षण देते.
दोरी पूजा :-
या तिसर्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गौरीच्या पूजेबरोबरच गुंडांना कापसाच्या सोळा गाठी देऊन गौरीची पूजा देखील करतात. मग गुंडांनी हळदीने ते रंगवले आणि गळ्याला दोरी बांधून नवीन पीक येईपर्यंत गळ्याला ठेवले.अश्विन वद्य अष्टमीची गळ्यावरून काढून पूजा केली जाते. ही दोरी महालक्ष्मीला समजली.
गौरी गणपती विविध प्रांताद्वारे :-
दक्षिण भारत :-
भाद्रपद शुक्ल तृतीयेपासून गौरीचा सण सुरू होतो आणि बरेच दिवस टिकतो. प्रत्येक गावात गौरीची मूर्ती तयार करुन त्याची पूजा केली जाते. त्याला रस्त्यावरही चालवले जाते.
कोकण :-
या दिवशी महाराष्ट्रातील कोकण भागातील कोळी समाजातील महिला तेरडाचा कोंब आणतात आणि लक्ष्मी म्हणून पूजा करतात. या दिवशी देवीला मासे देण्यात येतात.
गौरी गणपतीची संपूर्ण माहिती समाप्त .
*उभ्या गौरी*
तुमच्याकडे उभ्याच्या गौरी आहेत न ग, बापरे केवढं करावं लागतं-असे dialogue ऐकू यायला लागले की समजावं की गौरी, गणपती जवळ आलेत
गणपती कितीही दिवस असला तरी बाप्पाना आपले मोदक केले की झालं, ते काही बिचारे एवढं सगळं मागत नाहीत. मोदकाचा नैवैद्य मिळाला की खूष.
ज्यांच्या सासर माहेरी उभ्या गौरी असतात त्यांचं लग्न झालं की सासूबाईचा dialogue ठरलेला, यावेळी मदतीला आहे ही, नाहीतर मी एकटीच करत होते. दुसरीकडे आई चिंतेत. आता माझं कस होणार?
ज्यांच्या सासरी उभ्या गौरी असतात आणि माहेरी नाही, त्यांना ह्या गौरी जेवणाची इतकी भिती असते काही विचारू नका.पण पहिलं वर्ष झालं की मग त्यापण सरावतात.
ज्यांच्या फक्त माहेरी उभ्या गौरी असतात आणि सासरी नाही, त्यांची मजा. 2 दिवस माहेरपण फिक्स. हौस भागते पण जबाबदारी आई घेते.आहे न मजा.
उभ्या गौरी म्हणलं की तयारी काही विचारू नका. सगळ्यात आधी एक दोन महिने कपाटातल्या साड्या हुडकायला सुरवात होते. कुठली साडी नेसवायची? कसबस 1 साडी आपण निवडतो आणि दुसरीच्या खरेदीला बाहेर पडतो. दुकानात जाताना ती घरची साडी बरोबर नेतो सुद्धा. अहो ह्याला जोडी शोभेल अशी दाखवा अशी पहिली मागणी दुकानदाराला केली जाते. हळूहळू साड्यांचा ढीग पडतो पण जोडी मनास येत नाही. मग बहुदा बरोबर आलेली मैत्रीण म्हणते की अग त्यापेक्षा दोन्ही नव्याच घे की. मग मनातल्या मनात हिशोब सुरू . एकदाच असतात गौरी वर्षातून ,होउदे खर्च , तेवढीच आपल्या आवडीची साडी घेता येईल. एक नणंदेला देऊ ती पण खूष. अशी एकदा मनासारखी साडी झाली की मग जरा मूड येतो. नंतर गौरीची सवाष्ण , तिची शोधाशोध. प्रत्येकीला आपल्या माहेरी जायचं असत किंवा स्वतःकडे तरी असतात , त्यामुळे आधी बुक करावी लागते, आणि दोनदोन वेळा फोन करून आठवण पण करून द्यावी लागते.हे कधी जेव्हा नणंद बाहेरगावी असेल तरचा प्रश्न.
घर आवरणे,बाकीची तयारी हे सर्व 2, 3 दिवस आधी होत. गणपतीचे दोन दिवस मग आरास, मोदक ह्यात जातात. ते झालं की मग खरा जोर येतो गौरीच्या तयारीसाठी.
कितीही प्लॅंनिंग केलं तरी आयत्यावेळी काहितरी धावत जाऊन आणावच लागत.
आणि finally गौरी यायचा मुहूर्त बरोबर गाठला जातो. साड्या नेसवण फार कठीण. एखादंवेळी अर्ध्यातासात होणार काम कधीकधी 2 तास लावून जात. मग मनात नाना विचार, काही चुकलंय का यंदा, अस कस होतंय? तेवढ्यात मदतीला हक्काची शेजारीण / जाऊ किंवा नणंद येते आणि वहिनी तुम्ही बसा 5 मिनिटं मी करते अस म्हणते आणि झटकन गौरी बसतात. खर तर त्या उभ्या असतात, पण म्हणताना आपण बसल्या असच म्हणतो, मग रात्री फोनवर बोलायला वेळ नसला तरी गौरी कधी बसल्या ह्या चौकशीसाठी आलेला फोन सर्व कहाणी सांगूनच ठेवला जातो.
प्रत्यक्ष गौरी जेवणादिवशी तर विचारूच नका. प्रत्येक जण 10 हाताच काम करत असते.एकीकडे तोंडाचा पट्टा पण चालू. कामवाल्या मावशीपण सुट्टीवर, त्यांच्या गौरीं साठी , हाल विचारू नका.
पण मूलं जरा लांबच असतात आईपासून. त्यादिवशी त्यांचा कुठलाही हट्ट पुरवला जाणार नाही हे त्यांनाही पक्के ठाऊक असते . गौरीजेवण, एकच लक्ष्य.
सर्व तयारीमुळे जेवण यथासांग पार पडत.
पण हे होईतो 4 वाजतात. मग संध्याकाळची तयारी. दहा मिनिटे बसावं असा विचार येतो आणि तितक्यात कोणीतरी चारलाच येत. बर बोलणार काय?सगळ्याना आपणच संगीतलेलं की कधीही या हो सोयींनी. आपला पूर्ण अवतार.मग तसंच हसून स्वागत. रात्री 9 ला मधेच आरती करून, मुलांना जेवायला घालायचं.ती पण कंटाळलेली आणि पूर्ण दिवस सगळीकडे उधळून दमलेली.
11 ला मात्र सर्व अवसान संपत आणि पाठ टेकली जाते, ओट्यावरचा पसारा दिसत असूनही कानाडोळा करतो. आडवं पडलं तरी सगळे येऊन गेलेल्या लोकांची आठवण काढतच झोप लागते, अगदी समाधानाने.
गौरीची पाठवणी मात्र दरवर्षी डोळे ओले करून जाते. परगावी सासरी निघालेली लेक आणि गौरी यात अगदी साम्य.प्रत्येकवेळी जाताना मन तेवढंच हळवं होत. विसर्जनाला जाताना पाय रेटतच जातो बहुतेक वेळा.
खर सांगू का , मी गौरीच्या हळदी कुंकवाला जाते ते त्या मुखवट्याच्या गौरी पाहायला नाही तर त्या गौरी मनापासून सजवणाऱ्या आणि त्यासाठी दिवस रात्र खपून दमल्या तरीही अगदी उत्साहाने स्वागत करणाऱ्या सर्वांनसाठी. अस वाटत खऱ्या गौरी देखील पृथ्वीवर एक दिवस येत असाव्यात आणि पाय निघत नसेल म्हणून 3 दिवस यांच्याबरोबर रेंगाळतात.
*🔸गौरी विसर्जन पूजा विधी.🔸*
*🟣०२/०९/२०२५- गौरी विसर्जन...(रात्री ०९.५१ पर्यंत.)🙏*
*ज्येष्ठा गौरींचे विसर्जन भाद्रपद शुक्ल नवमी तिथीला केला जाते... या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरींची विधीवत पूजा करून आरती केली जाते.....*
*त्यानंतर मूर्तीवर अक्षता वाहून, मुर्तीचे मुकूट हलवून गौरींना निरोप दिला जातो... त्याआधी घरासमोर रांगोळी काढून हळदी- कुंकवाने गौरींची मार्गस्त पावले काढली जातात.....*
*यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते... काही ठिकाणी गौरींच्या मुर्ती विसर्जित केल्या जातात, तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे.....*
*राज्यातील विविध भागात हा उत्सव वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि मान्यतांनुसार साजरा केला जातो.....*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸गणपतीचे विविध अवतार.🔸*
*उपपुराण मानल्या जाणार्या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.....*
*गणेश पुराण...*
*गणेश पुराणात- गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे.....*
*महोत्कट विनायक- हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप, दिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला... या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.....*
*मयूरेश्वर- हा सहा भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे... याचे वाहन मोर आहे. त्रेतायुगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून हा जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकेय यास दान केला अशी आख्यायिका आहे. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.....*
*गजानन- हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला... या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला. अवतार समाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.....*
*धूम्रकेतु- द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार... वाहन निळा घोडा. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते.....*
*मुद्गल पुराण- मुद्गल पुराणात- गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते... दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे,*
*वक्रतुण्ड- हा प्रथम अवतार. याचे वाहन सिंह असून या अवतारात मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.....*
*एकदन्त - आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो... हा मूषकवाहन असून अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.....*
*महोदर- वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप... बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक. मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.....*
*गजवक्त्र वा गजानन-महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.....*
*लम्बोदर- ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक. वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.....*
*विकट- सूर्याचे प्रतीक... कामासुराचा वध केला. वाहन मयूर.....*
*विघ्नराज-विष्णूचे प्रतीक. ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य....*
*धूम्रवर्ण- शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा.अभिमानासुराचा नाश केला.....*
*आंतरजाल...*
*🔸श्रीगणेश उत्तरपूजा🔸*
*अगदी सोप्पी उत्तर पूजा...*
*ज्या दिवशी श्रीगणेशांचे विसर्जन करायचे असेल, त्या दिवशी विसर्जन समयी शुचिर्भूत होऊन कपाळाला गंध/अष्टगंध लावावे... आसनावर बसावे. उजव्या हातावर पळीभर पाणी व अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा....,*
*'श्रीगणेश प्रीत्यर्थ पंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये....'*
*असे म्हणून पाणी ताम्हानात सोडावे...*
*यानंतर श्रीगणेशांची पंचोपचारांनी पूजा करावी...*
*श्रीगणेशाय नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।*
*(गंध लावावे...)*
*श्रीगणेशायय नमः । पुष्पाणी समर्पयामि ।*
*(फुले वहावीत...)*
*श्रीगणेशाय नमः । धूपं समर्पयामि ।*
*(उदबत्ती ओवाळावी...)*
*श्रीगणेशाय नमः । दीपं समर्पयामि ।*
*(नीरांजन ओवाळावे...)*
*श्रीगणेशाय नमः । नैवेद्यं समर्पयामि ।*
*(नैवेद्य अर्पण करावा...)*
*विडा, दक्षिणा यावर पळीने पाणी सोडावे. नारळ अर्पण करावा... सर्वांनी आरती करावी. सर्व कुटुंबियांच्या कल्याणासाठी मागणे मागावे, सर्वांनी श्रीगणेशांना नमस्कार करावा...*
*या नंतर 'अनेन उत्तरपूजनेन श्रीगणेश देवतः प्रीयताम् न मम्। असे म्हणून ताम्हानात उदक सोडावे.....*
*यानंतर हातात अक्षता घेऊन म्हणावे,*
*यांतु देवगणाः सर्वे पुजामादाय पार्थिवीम् । इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनाय च ॥*
*असे म्हणून देवावर अक्षता वहाव्यात व मूर्ती पाटासह (आसनासह) किंचित सरकवावी.....*
*यानंतर आपल्या प्रथेप्रमाणे जयजयकारात विसर्जन करावे.....*
*🔸गणपतीची १०८ सार्थ नावे.🔸*
*भालचन्द्र : ज्याच्या कपाळावर चंद्र आहे.*
*बुद्धिनाथ: बुद्धी ची देवता.*
*धूम्रवर्ण : ज्यांचा वर्ण धूम्र आहे.*
*एकाक्षर: एकच अक्षर.*
*एकदंत: एकच दात असणारे.*
*बालगणपति: सगळ्यात प्रिय बाळ.*
*गजकर्ण: हत्ती समान कान असणारे.*
*गजानन: हत्ती समान मुख असणारे.*
*गजवक्र: हत्ती समान वक्राकार सोंड असणारे.*
*गजवक्त्र: हत्ती समान मुख असणारे.*
*गणाध्यक्ष: सर्व गणांचे स्वामी.*
*गणपति: सर्व गणांचे स्वामी.*
*गौरीसुत Gaurisut आई गौरीचे पुत्र.*
*लंबकर्ण: ज्याचे कान लांब आहेत.*
*लंबोदर: ज्याचे पोट मोठे आहे.*
*महाबल Mahaabal अत्यंत बलशाली.*
*महागणपति: देवाधिदेव.*
*महेश्वर: संपूर्ण ब्रह्मांडाचे देव.*
*मंगलमूर्ति Mangalmurti सर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे.*
*मूषकवाहन: ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे.*
*निदीश्वरम: धन संपत्ती देणारे.*
*प्रथमेश्वर: सर्वात प्रथम येणारे देव.*
*शूपकर्ण: सुपाएवढे कान असणारे.*
*शुभम: सर्व शुभ कार्यांचे देवता.*
*सिद्धिदाता: इच्छा पूर्ण करणारे देवता.*
*सिद्धिविनायक: सफलता चे देवता.*
*सुरेश्वरम: देवांचे देव.*
*वक्रतुंड : वक्राकार तोंड असणारे.*
*अखूरथ: ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे.*
*अलंपत: अनंतापर्यंत असणारे देव.*
*अमित: अतुलनीय देवता.*
*अनंतचिदरुपम : अनंत व्यक्ती चेतना असणारे.*
*अवनीश : संपूर्ण विश्वाचे स्वामी.*
*अविघ्न : संकटांना दूर करणारे.*
*भीम: भव्य.*
*भूपति : धरतीचे स्वामी.*
*भुवनपति : देवांचे देव.*
*बुद्धिप्रिय: ज्ञानाची देवता.*
*बुद्धिविधाता: बुद्धीचे स्वामी.*
*चतुर्भुज: चार हात असणारे.*
*देवादेव : सर्व देवाचे देव असणारे.*
*देवांतकनाशकारी: वाईट राक्षसांचे विनाशक.*
*देवव्रत: सर्वांची तपस्या स्वीकारणारे.*
*देवेन्द्राशिक: सर्व देवांचे रक्षण करणारे.*
*धार्मिक : दान करणारे.*
*दूर्जा: कधी न पराजित झालेले देव.*
*द्वैमातुर : दोन आई असणारे.*
*एकदंष्ट्र: एकच दात असणारे.*
*ईशानपुत्र: शंकराचे पुत्र.*
*गदाधर: ज्यांचे गदा हे शस्र आहे.*
*गणाध्यक्षिण : सर्वांचे देवता.*
*गुणिन : सर्व गुणांचे स्वामी.*
*हरिद्र : स्वर्ण रंग असणारे.*
*हेरंब: आईचा प्रिय पुत्र.*
*कपिल: पिवळा रंग असणारे.*
*कवीश: सर्व कवींची देवता.*
*कीर्ति: यशाचे स्वामी.*
*कृपाकर: सर्वांवर कृपा ठेवणारे.*
*कृष्णपिंगाक्ष: कृष्णासमान डोळे असणारे.*
*क्षेमंकरी: क्षमा करणारे.*
*क्षिप्रा: आराधना करण्यासारखे.*
*मनोमय: मन जिंकणारे.*
*मृत्युंजय: मृत्यूला हरवणारे.*
*मूढ़ाकरम : आनंदात असणारे.*
*मुक्तिदायी: शाश्वत आनंद देणारे.*
*नादप्रतिष्ठित: ज्यांना संगीत प्रिय आहे.*
*नमस्तेतु: वाइटांवर विजय मिळवणारे.*
*नंदन: शंकराचे पुत्र.*
*पाषिण Pashin दगडा सारखे मजबूत असणारे.*
*पीतांबर: पिवळे वस्त्र धारण करणारे.*
*प्रमोद: आनंद.*
*पुरुष : अद्भुत व्यक्ती.*
*रक्त: लाल रंगाच्या शरीराचे.*
*रुद्रप्रिय : शंकरांना प्रिय असणारे.*
*सर्वदेवात्मन: प्रसादाचा स्वीकार करणारे.*
*सर्वसिद्धांत: सफलतेची देवता.*
*सर्वात्मन: बह्मांडाची रक्षा करणारे.*
*शांभवी : देवी पार्वती.*
*शशिवर्णम : चंद्रासमान वर्ण असणारे.*
*शुभगुणकानन: सर्व गुणांची देवता.*
*श्वेता: पांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे.*
*सिद्धिप्रिय: इच्छापूर्ती करणारे.*
*स्कंदपूर्वज : कार्तिकेय ज्याचा भाऊ आहे.*
*सुमुख : शुभ मुख असणारे.*
*स्वरुप : सौंदर्याची देवता.*
*तरुण: ज्यांच्या आयुष्याची सीमा नाही,अमर.*
*उद्दण्ड : नटखट असणारे.*
*उमापुत्र: पार्वतीचा मुलगा.*
*वरगणपति: वर देणारे देव.*
*वरप्रद: वर पूर्ण करणारे.*
*वरदविनायक: यशाचे स्वामी.*
*वीरगणपति : वीर देवता.*
*विद्यावारिधि Vidyavaaridhi विद्या देणारी देवता.*
*विघ्नहर: संकट दूर करणारे.*
*विघ्नहर्ता: संकट दूर करणारे.*
*विघ्नविनाशन : संकटांचा अंत करणारे.*
*विघ्नराज : सर्व संकटांचे स्वामी.*
*विघ्नराजेन्द्र : सर्व संकटांचे स्वामी.*
*विघ्नविनाशाय: संकटांचा नाश करणारे.*
*विघ्नेश्वर : संकट दूर करणारे.*
*विकट : भव्य.*
*विनायक: सर्वांचे देवता.*
*विश्वमुख: संपूर्ण विश्वाचे देवता.*
*यज्ञकाय : सर्व यज्ञा स्वीकार करणारे.*
*यशस्कर : यशाचे स्वामी.*
*यशस्विन: सर्वात लोकप्रिय देवता.*
*योगाधिप : ध्यानाची देवता.*
*स्रोत: आंतरजाल, marathimindset.com*
कोकणातील प्रसिद्ध पद्धत वोवसा - ओवसा - औसा*
।। "मुळ शब्द शोधण्याचा बराच प्रयत्न केला परंतु
।। त्यात प्रामुख्याने पुढील मतमतांतरे आढळली
● वसा :--- गौरी मातेचा वसा घेणे,
● हौसा :--- गौरीमातेकडुन हौस भागवणे,
● अंशा :--- मातेकडे अंश रुपाने आपल्याकडे प्रकटण्याची विनवणी,
● आय्स :--- आऊस - ( कोकणात आईचे पर्यायी शब्द )
।। वसा = आऊसा, औक्षणचा अपभ्रंश - औशा / औसा,
।। अखंड ओवाळणीचा + वसा, अहो ( अखंड ) + वसा
।। ( वंश ) = अहोवसा ( अखंड वंश पुढे चालत राहण्यासाठी )
।। असो म्हणजे तुमच्या लक्षात आले असेलच की
।। एकुणच सगळा आटापिटा गौरीमातेच्या
।। कृपाछत्रासाठी केला जातो.
।। प्रथम आपण वोवसा - ओवसा - औसा म्हणजे काय
।। ते पाहुया. एका सुपात ५ प्रकारच्या भाज्या, ५
।। प्रकारच्या वेलींची पाने, ५ प्रकारची फळे,
।। करंडा फणी, ओटी ( खण व नारळ ) आणि वानाच्या
।। पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून,
।। अशी ५ सुपे गौरीच्या पुढ्यात वोवसन्यासाठी -
।। ओवसा करण्यासाठी / भरण्यासाठी ठेवतात.
।। आता वोवसणे - ओवसा करणे / भरणे म्हणजे नक्की
।। काय ते पण सांगायला पाहिजे. घरातील सुवासिनी
।। गौरी समोर जाऊन पहिले हळद - कुंकू लावून गौरीची
।। पूजा करायची आणि मग २ हातांनी भरलेले सूप
।। धरून गौरी समोर करून खाली ३ वेळा सूप ओढायचे
।। या प्रकियेला गौरीला वोवसने असे म्हणतात. नवीन
।। लग्न झालेली मुलगी ५ सूप घेऊन पहिली आपल्या
।। माहेरच्या गौरीला वोवसा वोवसून सासरी सूप घेऊन
।। यायचे आणि सासरच्या गौरीला वोवसायचे अशी
।। पद्धत आहे.
।। ज्या वर्षी रवि पूर्वा नक्षत्रावर गौरी आवाहनाचा
।। दिवस असतो त्यावर्षी नवीन जोडप्यांचे वोवसे
।। असतात म्हणजेच सुर्याचा पुर्वा नक्षत्र प्रवेश साधारण
।। एका वर्षाआड गौरी आवाहनावेळी होत असतो तो
।। दिवस ( उदा. ऑगस्ट २०१७ ची गणेश चतुर्थी
।। पाहावी ) वोवसा करुन झाले कि सर्व जोडपी
।। आपल्या पेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडून
।। वोवश्यातले पान वाण म्हणून त्यांना देतात आणि
।। सर्व मोठी मंडळी आशीर्वादाच्या स्वरुपात भरगच्च
।। पैसे देतात...
।। अशा प्रकारे गौरी म्हणजेच साक्षात आदिशक्तीचे पुजन
।। करुन तिच्याकडे अखंड सौभाग्याचं लेणं मागितलं जातं
*🔸अदु:ख नवमी🔸*
*🟣०१/०९/२०२५- अदु:ख नवमी...!*
*अदु:ख नवमी ही एक दुर्लक्षित पण महत्त्वाची धार्मिक तिथी आहे, जी भाद्रपद शुद्ध नवमीला येते... या दिवशी पाताळगंगा तटावर (विशेषतः त्र्यंबकेश्वर) येथे स्नान आणि श्राद्धाचे मोठे महत्त्व आहे. "अदु:ख" म्हणजे "दु:ख न येणारी", म्हणजेच या दिवशी केलेल्या कर्मांमुळे पूर्वजांना आणि स्वतःलाही कोणतेही दु:ख येत नाही, अशी श्रद्धा आहे.....*
*अदु:ख नवमीचे धार्मिक महत्त्व:*
*१. पितृ तर्पणासाठी विशेष दिवस:*
*अदु:ख नवमीला पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, आणि पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्या कुलाला सुख-समृद्धी लाभते.....*
*२. पातक निवारण करणारी तिथी:*
*या दिवशी केलेले स्नान, जप, दान आणि तर्पण हे सर्व पापांचे उच्चाटन करणारे मानले जाते.....*
*३. त्र्यंबकेश्वरचे विशेष महत्त्व:*
*नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे "पाताळगंगा" नदीच्या तीरावर हजारो भाविक या दिवशी स्नान करतात व तर्पण करतात. येथे "सप्तर्षी सरोवर" देखील प्रसिद्ध आहे.....*
*अदु:ख नवमी कधी असते?*
*तिथी: भाद्रपद शुद्ध नवमी (भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील नवमी)*
*या दिवशी काय करावे?*
*१. पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे – विशेषतः गोदावरी, गंगा, यमुना किंवा स्थानिक पवित्र जलाशय.....*
*२. पितृ तर्पण व पिंडदान करावे.....*
*३. व्रत ठेवावे आणि ब्राह्मणांना भोजन, दक्षिणा व वस्त्र दान द्यावे.....*
*४. 'अदु:ख नवमी'चे व्रत केल्याने संपूर्ण वर्षभर दु:ख टळते, असे मानले जाते.....*
*या दिवशी आपल्या पितरांच्या आठवणीने श्रद्धेने केलेली सेवा त्यांना मोक्षप्राप्तीस मदत करते... हे एक प्रकारचे "पितृऋण" फेडण्याचे पवित्र कार्य मानले जाते.....*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸गौरीपूजन.🔸*
*गौरीपूजन हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे... गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात.....*
*गौरी शब्दाचा अर्थ...*
*संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या... तसेच गौरी म्हणजे पार्वती, पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.....*
*व्रताचे स्वरूप...*
*भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/ गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात... ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात....*
*आख्यायिका आणि इतिहास...*
*हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे... अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई, असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे. ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.....*
*एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली... त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.....*
*स्रोत: विकिपीडिया...*
*🔸ज्येष्ठा गौरी पूजन.🔸*
*अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात... तीन दिवस साजरा केल्या जाणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्या दिवशी विसर्जन करतात.....*
*पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या... तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.....*
*हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते... अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात.....*
*गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात... थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.....*
*महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात... हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात.....*
*माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे... माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.....*
*तिसर्या दिवशी खीर- कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात... परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.....*
*आंतरजाल...*
*🔸समृद्धीच्या पावलांनी गौराई आल्या.🔸*
*गणेशाच्या आगमनानंतर वेध लागले होते ते गौरींच्या आगमनाचे... वाजतगाजत, हळदीकुंकवाचे सडे घालत गौराईंची घराघरांत प्रतिष्ठापणा करण्यात आली. आता दोन दिवस गौराई घरात राहून आशीर्वाद देणार आहेत.*
*‘पाऊस पडू दे, गंगा भरू दे, भादव्यात मी येईन गं... तेरड्याच्या फुलांवर, वस्ती मी करीन गं’ गेले महिनाभर असा निरोप पाठविणारी गौराई माहेरी आल्याने सगळीकडे आनंदी आनंद झाला आहे. गौराईला आणण्यासाठी फुलोरा घेऊन नदीवर, पाणवठ्यावर माता-भगिनींनी एकच गर्दी करतात. फुले, आघाडा, दुर्वा, कण्हेरीच्या फुलांच्या माळांनी सजविलेले, लखलखीत घासलेले तांब्या-पितळेचे न्हावण घेऊन आणि जरीच्या साड्या, अंगभर दागिने, हातभर बांगड्या लेवून गौराई गीते गात सर्वत्र हा सोहळा रंगतो.*
*हिरवा शालू, नथ आणि विविध अलंकारांनी नटलेल्या या महिला आणि मुलींच्या सामूहिक आविष्काराला गौराई गीतांची सुरेल साथ लाभल्याने अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने घडते. झेंडू, गलाडासह विविध फुलांनी बाजारपेठ फुलते. फुलांचे प्रतिकिलो दर गगनाला भिडतात.*
*ग्रामीण व शहरी भागात गौरीचे मुखवट्यांऐवजी काही ठिकाणी एरंडाची पाने वापरली जातात. काळानुरूप या मुखवट्यात बदल झाला असून, गौरीला आता टेक्नॉलॉजीचा स्पर्श होत आहे. त्यातूनच त्यांचे सुबक, रेखीव, अलंकारयुक्त असे मुखवटे उपलब्ध झाले आहेत. बाजारपेठांतील दुकानातून मुखवटे विक्रीस असतात.*
*गौरींपुढे झाली आरास*
*चैत्रागौरीसारखी आरास गणपती गौरींपुढेही करण्यात येते. लाडू, चकल्या, करंज्या यांसारख्या दिवाळीतल्या पदार्थांचीही या काळात रेलचेल असते. काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवण्यात येतात. काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात, तर काहींच्या घरी उभ्या. उभ्या महालक्ष्म्यांना पितळी किंवा लाकडी स्टॅण्डही असून, कोणी कोठ्यांना साड्या नेसवून त्यावर मुखवटे बसवतात. काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर काही पितळी तर काही लाकडाचे असतात. कोठ्यांना साड्या नेसवताना त्या कोठ्या लाडू, करंज्यांसारख्या मिष्टांन्नांनी भरून ठेवण्याची पद्धत काही भाविकांकडे पहायला मिळते.....*
*🔸कोकणात गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, कारण…*
*महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले चार लोकं एकत्र आले न की मग आमच्याकडे असं आणि तुमच्याकडे तसं हे विषय रंगतात... असाच विषय काल रंगलेला. निमित्त होतं गणपती आणि गौऱ्यांचं. आत्ता काही भागात गौराई न म्हणता लक्ष्मी म्हणतात. तर काही ठिकाणी गौरा म्हणतात. यावरूनच विषय सुरू झाला....*
*मराठवाड्यातल्या लोकांनी त्यांच सांगितलं, पार गडचिरोलीमधल्या दोस्ताने तिकडच्या प्रथा सांगितल्या पण इटंरेस्टिंग वाटली ती कोकणातील प्रथा. कारण कोकणातल्या गड्यानं सांगितलं आमच्याकडे गौराईला चिकन, मटण असा नैवेद्य असतो.....*
*कस शक्य आहे चिकन मटण ते पण थेट देवाला. म्हसोबा, बिरोबा अशा देवांना बकरं लागतं हे माहित होतं पण गौराईला पण ही गोष्ट पचायला थोडी जड होती त्यामुळं विस्ताराने शोध घ्यायचं ठरवलं तेव्हा कारण समोर आलं.....*
*कारण आहे पौराणिक कथेचं.... या कथेनुसार पार्वती देवीचं लग्न महादेवासोबत अर्थात शंकरासोबत झालं... आत्ता शंकर हा स्मशानात राहणारा देव. लग्नानंतर पार्वती आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली. वाटेत पार्वतीच्या रक्षणासाठी महादेवांनी आपल्यासोबत स्मशानात असणाऱ्या भूतगणांना पाठवलं. या भूतगणांनी पार्वतीचं रक्षण केलं आणि पार्वती मातेला सुखरूप तिच्या माहेरी सोडलं.....*
*माहेरी आल्यानंतर पार्वतीसाठी गोडधोड पदार्थ बनवण्यात आले. कौतुकसोहळा सुरू झाला... पण माहेरच्या लोकांच लक्ष्य भूतगणांकडे गेलच नाही. भूतगणांच्या जेवणाचं काय? नेमकं हे हेरलं ते माता पार्वतीने…..*
*तिने भूतगणांच्या जेवणाची सोय केली... मात्र भूतगण स्मशानात रहात असल्याने मांसाशिवाय ते दूसरं काहीच खात नसतं. त्यामुळे या भुतगणांना मांस देण्यात आलं. त्यामुळेच प्रथा पडली ती गौराईला मांसाहाराचा नैवेज्ञ द्यायची.*
*वास्तविक हा नैवैज्ञ गौराईसोबत आलेल्या भूतगणांना असतो... पण पौराणिक कथा माहित नसल्याने गौराईसाठीच हा नैवेज्ञ असल्याची मान्यता रुढ होत गेली.....*
*स्रोत: आंतरजाल, बोलभिडु...*
*🔸श्रीमहालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय?🔸*
*भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस श्रीमहालक्ष्मी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती श्रीमहालक्ष्मी विषयी उपलब्ध आहे.*
*जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठा लक्ष्मी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली- वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात.*
*नोट :-*
*भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्रीलक्ष्मी हे जेष्ठागौरी आहे पण जेष्ठागौरी श्री शंकरांची पत्नी म्हणजे देवी पार्वती म्हणजे जेष्ठागौरी आहे यांचे पुजन चैत्र सह जेष्ठ महिन्यात व श्री मंगळागौर ही श्रावण महिना पुजन करण्यात येते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या दोन श्रीमहालक्ष्मी कश्या या बद्दल श्री वेद वाड्मयत सुद्धा ‘नमो जेष्ठाच च कनिष्ठाय च’ ‘स्तेतानां पतये नमः’ अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.*
*मी समुद्र मंथन या लेखात सांगितल्या प्रमाणे मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्याची बहीण श्रीअलक्ष्मीचा जन्म झाला. श्रीमहालक्ष्मी म्हणजे (येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी (म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात.*
*याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्रीविष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थ(पिंपळाचे झाड) वृक्षा खाली रडत बसली.*
*तिथुन श्रीविष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.*
*या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो. श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचेआवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.*
*अष्टमीच्या दिवशी श्रीलक्ष्मी पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे ‘श्रीमहालक्ष्मी व्रत’ असे मानतात.*
*श्रीमहालक्ष्मी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे. श्रीमहालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो.*
*प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास.*
*गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.*
*पुजन माहिती.*
*श्रीमहालक्ष्मीचे आवाहन.*
*श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार प्रवेश दारातुन अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणलं जातं.*
*देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं. श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचेदेखील बनविलेले असतात . श्रीमहालक्ष्मीना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात.*
*श्रीमहालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्रीलक्ष्मी च्यापुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात.*
*श्रीमहालक्ष्मी पुजन माहिती.*
*दुसर्या दिवशी जेष्ठा नक्षत्रावर आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणा कडे सकाळी, दुपारी, किवा संध्याकाळी किवा रात्री महापुजन करतात यात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.*
*तिसर्या दिवशी तिला खीर कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात. अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.*
*श्रीमहालक्ष्मीची कहाणी.*
*( ही कहाणी दुसर्या दिवशी महापुजन झाल्यावर वाचावी..)*
*आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी श्रीमहालक्ष्मी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी श्रीलक्ष्मी आण! आई म्हणाली, बाळांनो, श्रीलक्ष्मी आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई श्रीलक्ष्मी आणेल!*
*वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.*
*बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.*
*सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.*
*म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्या दिवशी खीर केली.*
*संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!*
*श्रीमहालक्ष्मी नं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. श्रीमहालक्ष्मी आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठाअलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.*
*स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.....*
सृष्टीनिर्मितीसाठी ब्रम्हदेवांस श्रीगणेशाचे आशीर्वाद🌹💐
ब्रह्मदेव महान तपस्वी व्यासांना म्हणाले, “हे वत्स! मंगलमूर्ती गजाननास प्रसन्न करण्याचे अनेक मंत्र आहेत. ज्या मंत्रांमुळे सिद्धी लवकर प्राप्त होते व ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सहा सद्गुणांची प्राप्ती होते. असा मंत्र मी तुला सांगतो. गणेश मंत्रात एकूण सात कोटी महामंत्र सांगितले आहेत. त्या मंत्रांचे दिव्य रहस्य गणेश पित्यास म्हणजेच देवाधिदेव महादेवास व मला माहित आहे. महामंत्रांपैकी षडाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. अनुष्ठान करणाऱ्याचे अंतकरण प्रथम सात्विक असावयास हवे. त्याचा आहार ही सात्विक हवा. अनुष्ठान करणाऱ्या गणेश भक्ताने प्रथम अभ्यंगस्नान करून शुचिर्भूत व्हावे, नंतर सोवळे नेसून दर्भासन किंवा त्यासारख्या शुद्ध आसनावर मनात कोणताही विकल्प न आणता बसावे. नंतर ॐ केशवाय नमः | ॐ नारायणाय नमः | ॐ माधवाय नमः | असा नामोच्चार करत आचमन करावे. त्यानंतर प्राणायाम करावा. श्रीगजाननाच्या पवित्र चरणकमलांपासून मस्तकापर्यंतच्या दिव्य स्वरूपाचे हृदयात ध्यान करून मानसपूजा करावी.” अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. महर्षी व्यासांना समाधान झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचे आभार मानले.
*एकाक्षरी मंत्र* : ॐ गं ॐ
*षडाक्षरी मंत्र* : ॐ वक्रतुण्डाय हुं ॐ
देवाधिदेव ब्रह्मदेवाकडून ही फलश्रुती ऐकून व्यासांना परमानंद झाला. ते ब्रह्मदेवास म्हणाले, “हे वात्सल्यमूर्ती ब्रह्माजी, आपण जे काही आत्ता सांगितले ते ऐकून माझे कान तृप्त झाले. या मंत्राचा महिमा विलक्षण आहे. किती ऐकले तरी मला समाधान होत नाही. त्यामुळे या दिव्य मंत्राच्या सहाय्याने कोणती सिद्धी प्राप्त झाली हे मला सांगा”, त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी व्यासांना खालील माहिती दिली.
सृष्टी निर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवावर पडल्यावर त्यांना ही सृष्टी कशी निर्माण करावी याबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यावेळी त्यांनी गणेशाची प्रार्थना केली की, “हे विघ्ननाशका, सृष्टी निर्मितीबाबत मी अज्ञानी आहे. मला याबाबतीत मार्गदर्शन करावे.” तेव्हा विनायक म्हणाले, “हे काम वाटते तेवढे अवघड नाही. माझ्या देहात सर्व ब्रह्मांड आहे, ते ब्रह्मांड एकदा तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व कल्पना येईल.” त्यानंतर श्रीगणेशाने ब्रह्मदेवास आपल्या श्वसन मार्गाने उदरात नेले. ब्रह्मदेवांना गणेशाच्या देहात अनेक ब्रम्हांडे दिसली. त्यामुळे ब्रह्मदेव भांबावून गेले. गजाननाने स्वतःच्या अफाट शक्तीने एक ब्रम्हांड फोडून दाखवले. या ब्रम्हांडात ब्रह्मदेवास सर्व सृष्टीचे दर्शन झाले. त्या उदरातील ब्रम्हांडात पृथ्वी, मनुष्य, ऋषी, राक्षस, देव, स्वर्ग इत्यादि सर्वांचे दर्शन. झाले अशा प्रकारच्या अनेक सृष्ट्या विनायकाच्या उदरामध्ये ब्रह्मदेवांना बघावयास मिळाल्या. ब्रम्हांडाची रचना पाहून ब्रह्मदेव गोंधळून गेले. त्यांनी गणेशाला उदरातून बाहेर काढण्याची विनंती केली. ते म्हणाले, “ब्रह्मांडाचा अंत पाहणे माझ्या हातून शक्य नाही. माझे आठ डोळे सुद्धा ब्रह्मांड पाहण्यास अपुरे आहेत. खरोखर तू अनादि अनंत आहेस.” ब्रह्मदेवाची हि द्विधा स्थिती पाहून श्री गणपतीने त्यास आपल्या उदरातून बाहेर काढले.
आपल्याला साक्षात लंबोदर श्रीगणेशाचे दर्शन झाले व स्वतः गणेशाने आपणास वेद, शास्त्रे, पुराणे यांचे गुढ ज्ञान दिले, अशामुळे ब्रह्मदेवास गर्व झाला. त्यांना वाटले की माझ्यासारखा भाग्यवंत त्रैलोक्यात कोणीही नाही. आता आपण कोणालाही वाटेल तो वर किंवा शाप देऊ शकतो. सृष्टीची निर्मिती करणे सुद्धा अत्यंत सोपे आहे. असे समजून त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीस सुरुवात केली. पण दुर्दैवाने अनेक विघ्ने समोर येऊन उभी राहिली. हजारो विघ्ने ब्रह्मदेवाभोवती गोल गोल फिरू लागली. ब्रह्मदेवासमोर सर्व विघ्ने विचित्र हातवारे करत नाचू लागली. त्या सर्वांनी ब्रह्मदेवास उचलले व वर फेकले. खाली पडल्यानंतर एकाने ब्रह्मदेवाच्या चारही शेंड्या धरल्या व ओढायला सुरुवात केली. दुसऱ्या विघ्नाने ब्रह्मदेवाची दाढी उपटण्यास सुरुवात केली. पाच सहा विघ्नांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवास टपला मारण्यास सुरुवात केली. अशा रीतीने ब्रह्मदेवास त्या विघ्नांनी छळून काढले. काही वेळानंतर ब्रह्मदेवास श्री गणेशाचे स्मरण झाले.
आता श्री गणेश आपणास सोडवेल असे त्यांना वाटले. ब्रह्मदेव म्हणाले, “हे गजानना, तू विघ्नहर्ता आहेस. असे असताना सुद्धा मी सृष्टी निर्मिती करत असताना विघ्ने कशी काय उत्पन्न झाली ? हे विघ्ने मला छळून काढत आहेत. तू यांचा बंदोबस्त कर.” अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे प्रार्थना केली. त्यानंतर ब्रह्मदेव शांतपणे बसले होते. तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक स्वप्न पडले. स्वप्नात ब्रह्मदेवास एक मोठा वटवृक्ष दिसला. त्यांना वटवृक्षाच्या एका पानावर एक गोंडस निरागस बालक दिसले. त्या बालकाला चार करकमल होते, सर्वांगाला रक्तचंदनाची उटी होती. त्या बालकाच्या मस्तकावर रत्नांनी जडलेला मुकुट होता. गळ्यात सुवर्णमाला होत्या. कानात सुवर्ण कुंडले होती, त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते पण डोके मात्र हत्तीचे होते. त्याचा एक दात तुटलेला होता. त्या बालकाचे रूप मनोहर होते. बालकरुपी गजाननाने खाली उडी मारली व ब्रह्मदेवांकडे आले व त्यांना म्हणाले, “हे विधाता, सृष्टी निर्मिती करताना मी श्रेष्ठतम आहे असा तुला गर्व झाला. कोणतीही गोष्ट गर्वाने करू नये. तुझे गर्वहरण करण्यासाठी नानाविध विघ्नांनी तुला छळून काढले. आता मी तुझ्या मनातले ओळखले आहे. मी तुला सर्वात दिव्य असा एक अक्षरी मंत्र सांगतो. तू या मंत्राचा दहा लक्ष जप कर. त्यानंतर मी तुला सामर्थ्यवान बनवेन.”
ब्रह्मदेवांना जाग आली. तेव्हा ताबडतोब त्यांनी एकअक्षरी मंत्रउच्चारण द्वारा तपश्चर्येला प्रारंभ केला. ब्रह्मदेवाची ही घोर तपश्चर्या पाहून लंबोदर श्रीगणेशास आनंद झाला. गणेश ब्रह्मदेवास प्रसन्न झाला. गणेशाने ब्रह्मदेवास दिव्य दर्शन दिले. ब्रह्मदेवाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी गणेशास साष्टांग नमन केले व म्हणाले, “हे ओंकारस्वरूपा! तू अनाथांचा नाथ आहेस. तुझे हे दिव्य दर्शन भाग्यवंतांनाच लाभते. आज सोनियाचा दिवस आहे. तू माझ्यावर प्रसन्न झालास, त्यामुळे मी तुझ्याकडे वर मागतो. माझ्या हृदयकमलात तुझे सदैव स्मरण राहू दे. तुमच्या कृपेने मला सर्व सृष्टीची निर्मिती करता यावी. मी ज्या वेळी आपणास मार्गदर्शनासाठी बोलवेन तेव्हा आपण जरूर यावे.” श्री गणेश म्हणाला, “माझा मधुर प्रसाद सेवन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच माझ्या स्मरणाने तूमची सर्व विघ्ने नाहीशी होतील. मी सदैव तुमच्या वर कृपा वर्षाव करेन. आता तुम्ही वेळ न घालवता विश्वनिर्मितीच्या कामाला लागा.”
श्री गजाननाने ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे त्याला सृष्टी रचना करण्याचे दिव्य सामर्थ्य दिले. पूजा झाल्यानंतर तेथे दोन लावण्यवती कन्या निर्माण झाल्या. या दोन देवि लावण्यवती कन्या म्हणजेच सिद्धी व बुद्धी होय. ब्रह्मदेवाने या विश्वातील प्रत्येकाचे कल्याण होवो असा वर मागितला. सिद्धी व बुद्धीस श्री गणेशाकडे सुपूर्त केले. श्री गणेशाने त्या दोन कन्यांचा स्वीकार केला.
ब्रह्मदेवाने सर्वप्रथम गजाननाचे पुन्हा एकदा स्मरण केले. आपले बाहू, मांड्या व चरणकमल यांपासून क्षत्रिय वगैरे तीन वर्णांची उत्पत्ती केली. नाभिककमला पासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, चरणकमला पासून पृथ्वी अशा पद्धतीने चातुर्य पूर्वक ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने अनेक वस्तू निर्माण केल्या. या वस्तूंची निर्मिती केल्यामुळे मनुष्याला फायदाच झाला. यामध्ये ब्रह्मदेवाने सागर, पर्वत, सरिता, वृक्ष, वेली, गवत इत्यादी अनेक वस्तू निर्माण केल्या.
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय १५ वा*
बद्रिकाश्रमात बारा वर्षे तपश्चर्या झाल्यावर कानिफ उत्तरेकडे गेला. गोरक्ष दक्षिणेकडे गेला. दोघे आपल्या गुरूंचा शोध करू लागले. गोरक्षाला मच्छिंद्रनाथांच्या भेटीची फार उत्कंठा होती. तो जाईल तेथे मच्छिंद्राबद्दल चौकशी करीत होता. जाता जाता तो गौड देशात हेलापट्टण नगरात गेला. तेथे द्वारपाल होते. त्यांना गोरक्षाने विचारले, "या नगरात मच्छिंद्रनाथ आले होते का?" तेव्हा द्वारपाल म्हणाले, "येथे मच्छिंद्रनाथ नावाचा कोणी साधू आला नव्हता, पण जालंदर नावाचा एक साधू पूर्वी आला होता. काय हो त्याचे आश्चर्य ! तो डोक्यावर गवताचा भारा घेऊन जाई व गायींना गवत घाली. तो गवताचा भारा अधांतरीच डोक्यावर रहात असे." गोरक्षाला मोठे नवल वाटले. त्याने द्वारपालांना पुन्हा विचारले, "किती दिवस झाले? कुठे गेला तो?" द्वारपाल म्हणाले, "दहा वर्षे झाली असतील. पुष्कळ दिवस तो उकिरड्यावर पडून राही. एकाएकी कुठे गेला कुणास ठाऊक!"
मच्छिंद्राने आपले नाव बदलले असावे असे गोरक्षाला वाटले. मग गोरक्ष हेलापट्टण नगरात भिक्षा मागू लागला. तेथे एका रिकाम्या घरासमोर उभा राहून त्याने 'अलख निरंजन' अशी हाक दिली पण त्या घरात कोणीच नव्हते. मात्र तो उभा होता त्याच्या जवळून जमिनीतून 'जय अलख निरंजन' अशी आरोळी त्याला ऐकू आली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, "कोठे आहात तुम्ही?" आतून उत्तर आले. "मी जमिनीच्या पोटात आहे." गोरक्षाने विचारले, "आपले नाव काय?" आतून उत्तर आले, "जालंदर" गोरक्ष म्हणाला, "माझे नाव गोरक्षनाथ. माझे गुरू मच्छिंद्रनाथ. पण तुम्ही असे जमिनीत का गाडलेले आहात?" तेव्हा आतून जालंदराने मैनावती व गोपीचंद यांची सगळी कथा सांगितली. ती ऐकून गोरक्षाला फार राग आला तो म्हणाला, "महाराज, तुमची अशी स्थिती केली त्या राजाचे भस्म करून टाकतो. तुम्ही फक्त आज्ञा द्यावी!" जालंदर म्हणाला, "नको नको, तुम्ही आत्ता काही करू नका. जे झाले आहे ते नाथपंथाच्या हिताचेच ठरणार आहे. तुम्ही कोठेही ही गोष्ट बोलू नका. तुम्ही येथून पुढे जा. मग तुम्हांला कानिफनाथ भेटेल. त्याला हे सगळे सांगा तो युक्ती करून राजाचे कल्याण करील. पंथाचा महिमा वाढवेल आणि मला पण वर काढेल." त्यांचे ते सांगणे मान्य करून गोरक्ष जगन्नाथपुरीला गेला.
इकडे कानिफनाथानेही प्रवास सुरू केला. त्याने अनेक ठिकाणी लोकांना उपदेश करून पुष्कळ शिष्य गोळा केले. हळूहळू त्यांच्या शिष्यांची संख्या सातशेवर गेली. तो पुढे पूर्वदिशेने दूरपर्यंत गेला. कानिफनाथाने सातशे शिष्यांसह तेथून पुढे स्त्रीराज्याच्या सीमेवर दुसरा तळ ठोकला. हनुमंत रामाच्या सेतूवरून भुभुःकार करण्यासाठी निघाला. तो या स्त्रीराज्याच्या सीमेवर आला. त्याचेही पाय स्पर्शास्त्रामुळे जमिनीला चिकटले. पण तो वज्रदेही. त्याने काही त्या अखाला जुमानले नाही. त्याला पुढे नाथपंथाचे शेकडो लोक तळ ठोकून बसलेले दिसले. ते पहाताच त्याच्या मनात विचार आला, "मी मच्छिंद्राला आत पाठवून काहीतरी करून गुंतवून ठेवला आहे. हे लोक जर आत गेले तर त्याला परत नेतील. मग मैनाकिनी बिचारी दुःखी होईल. तेव्हा इथूनच या लोकांना घाबरवून परत हाकलले पाहिजे." असे ठरवून हनुमंताने विशाल रूप धरले. त्याचे रुप इतके भयंकर होते की कानिफाचे शिष्य घाबरून गुरूच्या मागे मागे लपू लागले. तो त्यांना अभय देऊन म्हणाला, "घाबरू नका! तुम्ही नुसती गंमत पहा." लगेच मारूतीने त्याचवेळी दगड व शिळा उचलून भिरकावण्यास सुरूवात केली. वज्रास्त्राने त्यांचे चूर्ण झाले. मग त्याने मुठीने बज्राख मोडून टाकले. त्यामुळे कानिफनाथ चिडला. त्याने कालिका, अग्नी, इंद्र व वायू ही अखे एकामागोमाग सोडली. त्या चारी अस्त्रांच्या तडाख्यात् मारूती सापडला आणि त्याची फारच वाईट स्थिती झाली.
इंद्र व कालिका ही अखे त्याच्या मागे व पुढे येऊन त्याचा घात करण्यासाठी झटू लागली. अग्नी व वायू ही अख्खे वरून त्याला त्रास देऊ लागली. त्याने वायूला "मी तुझा मुलगा आहे. मला त्रास देऊ नको." अशी प्रार्थना केली, तेव्हा ते अस्त्र क्षीण झाले. अग्नीला त्याने शेपटाला बांधून समुद्रात बुडविले, पण त्यामुळे समुद्राचे पाणी उकळू लागले. मग समुद्र माणसाचे रूप घेऊन वर आला. कारण उकळत्या पाण्यामुळे जलचर मरू लागले. पाहतो तो मारूती व कानिफ युद्ध करीत आहेत. अशावेळी वायूने मारूतीचा हात धरून त्याला आवरले व म्हटले, "बाबा रे, हे नाथ फार बलिष्ठ आहेत. यांच्याशी झगडा करू नको. तू मच्छिंद्राशी लढलास. त्याने तुला पर्वत डोक्यावर ठेवलेला असाच बद्ध ॐ करून ठेवला होता. तसेच बळ या कानिफाजवळ आहे. तू याच्याजवळ मैत्री कर!" मग समुद्र व वायू मारूतीला घेऊन कानिफाजवळ आले व त्यांनी त्या दोघांची मैत्री करून दिली. मारूती म्हणाला, "यांना स्त्रीराज्यात जायचे तर जाऊ द्या, पण मच्छिंद्राजवळ कोणीही योगासंबंधी भाषण करायचे नाही व त्याला बाहेर न्यायचे नाही!" मारूतीची ही अट कबूल करून कानिफनाथ शिष्यांसह सकाळी स्त्रीराज्यात शिरला. शेकडो नाथपंथी लोक आणि त्यांचा पुढारी असा एक कोणीतरी मोठा योगी येत आहे, अशी वार्ता स्त्रीराज्यात पसरली. त्याचे कानिफ हे नाव कळले. मच्छिंद्रालाही सर्व कळताच मच्छिंद्र मनातून दचकला. मैनाकिनीला आपण कसे सोडावे? त्याने कानिफाला मोठ्या वैभवानिशी सामोरे जाऊन त्याची व जालंदरनाथाची इत्यादी सर्व माहिती काढली. त्या सर्वांना स्त्रीराज्यात मरण आले नाही यांचे कारणही त्याला कळले. मग त्याने कानिफाला व त्याच्या सातशे शिष्यांना स्त्रीराज्यातच महिनाभर ठेवून घेतले.
*अल्लक निरंजन...आदेश*
#नवनाथकथा #नवनाथांचीकथा #नवनाथ #नाथसंप्रदाय #मच्छिंद्रनाथ #गोरखना #चौरंगीनाथ #मराठीकथा #धार्मिककथा #आध्यात्मिक
मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहात नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान, यांवरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता. भगवंतावाचून मनुष्य कसा सुखी होईल❓🔸️
❄लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो, तर मला अडाणी आवडतो. असे माझे सगळे जगाच्या उलट आहे. पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे.❄
🔹️ समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला. मी समाधानरूपी आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही, त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले❗🔹️
⭕आजपर्यंत मी एकच साधन केले: कुणाचे मन दुखवले नाही, आणि एका नामावाचून दुसऱ्या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा ! विद्या नाही, पैसा नाही, किंवा कला नाही. पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो, त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो.⭕
💠जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे; म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही, मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले. माझे सांगणे ऐकल्यानंतर पुनः तुम्ही ऐकायला येता, याची तीन कारणे असू शकतील..... 💠
•एक, मला चांगले सांगता आले नसेल;
•दुसरे,तुम्हाला ते समजले नसेल;
•किंवा तिसरे, सांगितलेले तुम्ही विसरला असाल.
🏵तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे; आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे. पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो.🏵
🛟मी एखाद्याला सांगत असताना, 'याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल' असे आपोआपच माझ्या मनात येते. माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय.🛟
💮माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही; पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मी मदत करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित होय; आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल.💮
♦️रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे❓ मी एकदा बीज पेरून ठेवतो. आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही.♦️
🌷#बोधवचन : आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काही सांगितलेच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचे माझ्याकडे लागले.🌷
*🙏आज ज्येष्ठा गौरी आवाहन, भाद्रपद शुद्ध पक्ष अनुराधा नक्षत्र….🙏*
*🙏गणेशोत्सवानंतर येणारा गौरी उत्सव हा महाराष्ट्रातील पारंपरिक सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते. गौरीला महालक्ष्मी म्हणतात आणि तिची पूजा घराघरांत आपल्या कुलाचाराप्रमाणे पारंपरिक रीतींनी केली जाते. गौरी ही शिवाची शक्ती आणि गणेशाची आई मानली जाते. ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा होण्यामुळे तिला ज्येष्ठा गौरी असेही संबोधले जाते. गौरी आगमन हा भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सोहळा आहे. गौराईचे आगमन घराघरांत सुख, समृद्धी आणि एकात्मतेचा संदेश घेऊन येते. गौराईची पावले घरात चैतन्य घेऊन येतात. गौरी उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे गौरी आवाहन. या दिवशी गौरीला घरात बसवून तिच्या आगमनाचे स्वागत केले जाते. दुसऱ्या दिवशी गौरीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते.🙏*
*🙏गौरी आल्यावर घरात नवा उजाळा, सुखाचे दिवस घेऊन आले सूर्योदय, प्रेमाने घर फुलेल पुन्हा, तिच्या आशीर्वादांनी शांती होईल परिपूर्ण, गौरी आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा….🙏*
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय १४ वा*
मैनावतीला आत्मज्ञान झाले तरी तिचे मन गोपीचंदात गुंतले होते. त्याला मोहातून मुक्त कसे करावे, याची काळजी ती करीत होती. माघाचा महिना होता. थंडीचे दिवस होते. राजवाड्याच्या वरच्या सज्जात मैनावती बसली होती. खाली सुंदर चौक होता. गोपीचंद तेथे स्नानासाठी आला होता. राजाचे दात घासणे चालले होते. बायका स्नानासाठी सुगंधित, उष्ण पाणी मोठमोठ्या घंगाळ्यातून आणून ठेवीत होत्या. सोन्याचा चौरंग होता. वखे, सुगंधी द्रव्ये, सर्वच मौल्यवान होते. त्यावेळी वरून मैनावतीने त्याला पाहिले. त्याची भोगलोलुप स्थिती पाहून तिला एकदम रडू आले व पटकन तिच्या नेत्रावाटे अश्रू ओघळले. ते नेमके गोपीचंदाच्या अंगावर पडले. तो चमकून वर पाहू लागला. कुठून अचानक हे कढत थेंब पडले? अशी शंका त्याच्या मनात चमकून गेली. त्याला मैनावती दिसली. तीच रडते आहे, असे दिसताच तो लगबगीने जीना चढून वर गेला व आईजवळ जाऊन तिला नमस्कार करून म्हणाला, "आई तू का रडतेस? तुला कसले दुःख आहे? तुझा
कोणी अपमान केला का? माझ्यासारखा पुत्र असतांना दुःख कशाचे?" गोपीचंदाचे बोलणे ऐकून मैनावतीचा शोक कमी झाला. ती म्हणाली, "मुला, तसे काही नाही रे. तुझे तरुण, सुंदर रूप पाहून मला
वाईट वाटले. तुझा पिता असाच सुंदर होता, पण शेवटी तो काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. तुला पाहून त्या टपून बसलेल्या काळाची मला भीती वाटली. तू त्या काळरुपी वाघाला पिंजऱ्यात बंद करून ठेवशील का? तसे केलेस तरच मला दुःख होणार नाही. नारद, व्यास, शुक, याज्ञवल्क्य, रामानुज कितीतरी भगवद्भक्त या जन्माचे सार्थक करून चिरंजीव झाले, तसाच तू पण हो!" आईचे हे कळकळीचे बोलणे ऐकून गोपीचंद म्हणाला, "आई, तू अगदी खरे सांगितलेस, पण सध्या असा कोण अधिकारी महात्मा लाभेल?" मैनावती म्हणाली, "मुला खरे तर तसे एक श्रेष्ठ योगी या नगरीतच आले आहेत त्यांचे नाव जालंदरनाथ. त्यांनाच तू शरण जा. तुझे वैभव मोठे आहे, राज्य मोठे आहे, परिवार मोठा आहे, पण त्यांतले काहीच टिकणारे नव्हे." तेव्हा गोपीचंद म्हणाला, "मी त्यांना शरण जाईन आणि कसून योगाभ्यास करीन. पण हे सर्व वैभव, सुख, संपत्ती कशी सोडू? आणखी बारा वर्षे मला हे सुख भोगू दे. मग मी त्याग करून योगमार्गाला लागेन!" मैनावती म्हणाली, "बाळा, बारा वर्षांची कोण खात्री देईल? उद्याची सुद्धा खात्री नाही. काळ केव्हा झडप घालील ते सांगता येणार नाही."
तिचे हे बोलणे लुमावंती ही पट्टराणी ऐकत होती. तिला वाटले, " ही मैनावती आई आहे की राक्षसीण? राजाच्या मनात काहीतरी भरवून त्याला दूर करण्यास जणू टपलेली दिसते. कैकयीने रामाला वनवासात पाठवले. तशीच ही राजमाता!" लुमावंती तेथून निघून गेली. गोपीचंद आईला म्हणाला, "आई, तू सांगतेस तसेच करावे, असे जर तुझे म्हणणे असेल तर मी स्वतः त्या महात्म्याचा मोठेपणा पाहीन. तो पटला, तर मी सर्व सुखभोग सोडून देईन व त्यांच्या सांगण्याप्रमाणे करीन. तू आता वाईट वाटून घेऊन नकोस!"
इकडे राणी लुमावंतीने पाच-सात राजस्त्रियांना एकीकडे बोलावले आणि म्हटले, "अग सखींनो, नगरात कोणीतरी जालंदर नावाचा जोगडा आलाय. राजाला त्याच्याकडून योगदीक्षा देववून त्यालाही जोगी बनविण्याचा दुष्ट बेत राजमातेने केलेला आहे. आपण २८ जणी राजाच्या पट्टराण्या असून तरी काय उपयोग! आपण काहीही करून मैनावतीने आखलेला बेत मोडून काढला पाहिजे. त्या सर्व राण्या तर्क लढवू लागल्या. पण कुणालाही निश्चयाने कोणतीच युक्ती शोधून काढता येईना. शेवटी लुमावतीच म्हणाली, "मला तरी यावर एकच उपाय दिसतो. तो म्हणजे, जालंदर कोण जोगडा आला आहे, त्याला गाठून त्याचाच नायनाट करावा. 'जोगड्याकडून राजाला दीक्षा देववून त्याला तीर्थाटनाला जाऊ द्यावे. तो गेला की, जालंदराला मोठ्या सन्मानाने राजसिंहासनावर बसवावा व त्याच्यासह सुखोपभोग घ्यावेत', असा मैनावतीचा बेत आहे, असे राजाला सांगावे म्हणजे राजा त्याचा नाश करील."
त्यांचे बेत ठरले. सगळ्याजणी आपापल्या महालात गेल्या. रात्रीचे भोजन झाल्यावर राजा लुमावंतीच्या महालात गेला. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा केली व राजा प्रेमात आला तेव्हा ती म्हणाली, "प्राणनाथ एक गोष्ट बोलू का?" राजा म्हणाला "भिऊ नको, सांग काय ते?" ती म्हणाली, "मला तुमच्या रागाची भीती वाटते." राजाने न रागावण्याचे वचन दिले. तेव्हा ती म्हणाली, "मैनावती मातेने तुम्हांला जालंदर नाथांकडे पाठवून जोगी करण्याचे ठरविले आहे. हे खरे का? तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवून जालंदराला आणून ती राज्यावर बसविणार आणि त्याच्यासह भोग भोगणार असाच तिचा गुप्त बेत असणार. आमचे कुंकू बळकट म्हणून ही गुप्त वार्ता आमच्या कानीं आली. खरे खोटे, काय ते तुम्ही पहा!" लुमावंतीचे बोलणे कानी पडताच गोपीचंद संतप्त झाला. अगदी विश्वासातले मंत्री व सेवक घेऊन तो गुप्त ठिकाणी गेला. तडकाफडकी रातोरात त्याने जालंदराला शोधून काढले. तेथेच एक खोल कूप होता, त्यात त्याला ढकलले व घोड्यांची लीद, शेण, केरकचरा यांची रास त्या कूपात घालून जालंदराला त्यांनी पूर्णपणे गाडून टाकले. सर्वांना गुप्तपणाची शपथ घातली. राजासह सर्वजण मध्यरात्री परत आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी जालंदरनाथाच्या बसण्याच्या जागी जालंदर दिसेनात, तेव्हा लोक आपसात चर्चा करू लागले, "अरे, इथला गोसावडा कुठे आहे? आज इथे तर उद्या तिथे, अशी वार्ता पसरत पसरत सगळीकडे झाली. मैनावतीच्या एका दासीने तिला ती वार्ता सांगितली. मैनावतीला मनातून फार वाईट वाटले, पण ते तिने बाहेर दाखविले नाही. राजस्त्रियांनासुद्धा ही वार्ता कळली. "जालंदरनाथ सकाळपासून कोठेही दिसत नाही. तो बहुतेक नगर सोडून दुसरीकडे गेला असावा." गोपीचंदाच्या सर्व स्त्रियांना आनंद झाला. तिकडे जालंदराने विहीरीत पडताक्षणी वज्रास्त्रमंत्र म्हटला. त्यामुळे त्याला काहीच दुखापत झाली नाही. वरून लीद, केरकचरा पडू लागला तेव्हा त्याने आकाशास्त्र मंत्रून आपल्याभोवती पोकळ जागा करून घेतली. त्यामुळे सर्व केरकचरा अधांतरी राहून त्याच्या अंगावर काहीच पडले नाही. तो तसाच ध्यानस्थ बसला. राजाविरुद्ध त्याने कोणताही अखप्रयोग केला नाही.
*अल्लक निरंजन...आदेश*
#नवनाथकथा #नवनाथांचीकथा #नवनाथ #नाथसंप्रदाय #मच्छिंद्रनाथ #गोरखना #चौरंगीनाथ #मराठीकथा #धार्मिककथा #आध्यात्मिक
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
एकदा इंद्र सहस्त्रपूर नामक नगरावरून विमानातून चालले असता, एका श्वेतकुष्ट झालेल्या सेवकाची नजर त्या विमानावर पडली. त्यामुळे इंद्राच्या विमानाची गती कुंठित झाली व ते त्या राज्यात उतरले. त्या राज्यात शूरसेन नामक राजा राज्य करीत होता. राजाने इंद्राची भेट घेतली , त्यांचे यथोचित स्वागत करून व कुठून आलात त्याची चौकशी केली. तेव्हा इंद्राने भृशुंडी ऋषींची भेट घेऊन आल्याचे वृत्त सांगितले. त्यावर राजाने भृशुंडी ऋषी कोण आहेत याची चौकशी केली. त्यावेळी इंद्राने राजाला भृशुंडी ऋषींची कथा सांगितली.
*भृशुंडी ऋषींची कथा*
दंडकारण्यानंद नावाचे एक नगर होते. तेथे एक कोळी राहत असे. तो अतिशय दुष्ट होता. तो चोऱ्या करायचा. लोकांना अनेक प्रकारे त्रास द्यायचा. एके दिवशी तो कोळी शिकारीसाठी अरण्यात गेला होता. श्वापदांच्या मागे धावून तो पुरता दमला. मग फिरत फिरत एका सरोवरापाशी आला. ते सरोवर गणेशतीर्थ म्हणून प्रसिद्ध होते. त्याने तेथे स्नान केले आणि तो माघारी वळला. समोरून मुद्गल ऋषी गजाननाचे नामस्मरण करीत येत होते. त्यांचा वध करून चीजवस्तू लुबाडावी असा विचार करून त्याने खडग उपसले. तर काय आश्चर्य! त्याने उगारलेले खडग खाली गळून पडले. त्या वेळी ऋषींची सौम्य, शांत, तेजस्वी मुद्रा पाहून त्याच्या मनाला एक वेगळेच समाधान लाभले. कोळ्याने मुद्गलांचे पाय धरले.
तो म्हणाला, “हे विप्रा, मला क्षमा कर. मी अत्यंत पापी आहे. पण आज तुझ्या दर्शनाने माझे मन शांत झाले. माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होणे हा गणेशतीर्थातील स्नानाचा आणि तुझ्या तपश्चर्येचा पुण्यप्रभाव आहे. मी तुला शरण आहे, तू माझा उद्धार कर.” धीवराची ती कळवळ्याची वाणी ऐकून त्यांचे मन द्रवले. त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला. आपल्या हातातील काठी तेथे जमिनीत रोवली आणि म्हणाले, “धीवरा, तू गणेशाय नमः या षडक्षरी मंत्राचा अहोरात्र जप कर. मी परतून येईपर्यंत किंवा या शुष्क काठीला पाने येईपर्यंत तू तुझे जपानुष्ठान चालू ठेव. तुझे कल्याण होईल!”
धीवराने त्यांचे म्हणणे ऐकले. मुद्गल ऋषी निघून गेल्यावर तो त्या काठी शेजारीच आसन घालून बसला. त्याच्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने काठीला ही अंकुर फुटला. त्याच्या स्वतःच्या अंगाभोवती वारूळ वाढले. त्यामधून गणेशमंत्राचा मंद ध्वनी ऐकू येत असे. कालांतराने मुद्गल ऋषी त्याच अरण्यातून अन्यत्र जात होते. त्यांना एकाएकी धीवराची आठवण झाली. शोध घेत ते काठी पूरलेल्या स्थानी आले. तिचे एका विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले होते. त्याच्या मुळाशी एक भलेमोठे वारूळ होते. त्यामधून गणेशाय नमः असा मंत्र जप ऐकू येत होता. आत मध्ये तपोमग्न धीवराची तेजस्वी मूर्ती दृष्टीस पडली. मुद्गल ऋषींनी आपल्या कमंडलूतील अभिमंत्रित जल त्याच्यावर शिंपडले. त्यामुळे तो भानावर आला.
त्याच्या भुवयांच्यामधून गणपती सारखीच एक सोंड उत्पन्न झाली होती. ते त्याचे बदललेले स्वरूप पाहून मुद्गल ऋषींना ही मोठे आश्चर्य वाटले. धीवराने डोळे उघडले. समोर आपल्या गुरुदेवांना पाहून तो अतिशय आनंदित झाला. भ्रुमध्यातून सोंड निघाली म्हणून त्यांनी धीवराचे *भृशुंडी* असे नाव ठेवले. ते म्हणाले, “वत्सा! तुझ्या तपश्चर्येने मी अगदी संतुष्ट झालो आहे. गणेशाची आराधना करताना तु ही गणेश स्वरूपच झाला आहेस.” भृशुंडीला आशीर्वाद देऊन मुद्गल ऋषी मार्गस्थ झाले.
मग तो तेथेच आश्रम बांधून राहू लागला. त्याने पुन्हा तपश्चर्या आरंभिली. असे शंभर वर्षे लोटली. त्याच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले. आपल्या आराध्य दैवताला संमुख पाहून भृशुंडी धन्य धन्य झाला. गणपतीने त्याला आशीर्वाद दिला. गणपती म्हणाले, “हे मूनी, हे स्थान नामलक्षेत्र म्हणून प्रख्यात होईल. येथील माझ्या मूर्तीच्या दर्शनाने भाविकांना मोक्ष मिळेल.
भृशुंडी ऋषींची कथा ऐकून शूरसेन राजाला मोठे समाधान वाटले. राजाने पुढे इंद्राचे विमान बंद पडण्याचे कारण विचारले व ते पुन्हा कसे सुरु होईल यावरही उपाय विचारला. इंद्राने सांगितले की तुझ्या राज्यात कोणी संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे एक वर्षाचे पुण्य येथे अर्पण केले, तरच हे विमान उड्डाण करेल. ते ऐकून शूरसेनाला मोठे नवल वाटले. तो म्हणाला, “देवराज संकष्टी चतुर्थी चे व्रत कसे करावे, याविषयी सविस्तर सांगा.” यावर इंद्राने शूरसेनाला संकष्ट चतुर्थी व्रत महात्म्य ची कथा सांगितली.
*कृतविर्यास पुत्रप्राप्ती*
प्राचीन काळी कृतवीर्य नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला. सुगंधा ही त्याची पत्नी. या राजाला यश, कीर्ती, ऐश्वर्य यापैकी कसलीच कमतरता नव्हती. पण पुत्रसंतान नसल्यामुळे हे राजदांपत्य नेहमी दुःखी असे. त्या राजाने राज्याची धुरा प्रधानांकडे सोपवली आणि सुगंधा राणीला बरोबर घेऊन तो अरण्यात निघून गेला. ते दोघे तेथे वायू भक्षण करून आणि झाडावरचे गळून पडलेली पाने खाऊन दृढतेने तपश्चर्या करू लागले. कृतवीर्य व सुगंधा यांची अवस्था पाहून नारदांना दया आली. ते त्वरेने स्वर्गलोकी गेले. तेथे त्यांनी कृतवीर्याच्या पित्याची भेट घेतली. त्यांना सर्व हकिकत सांगितली व ते पुढे म्हणाले, “त्यांना पुत्रलाभ व्हावा म्हणून तूच काहीतरी कर, त्यायोगे त्यांचाही जीव वाचेल आणि तुलाही गती मिळेल.”
नारदांकडून आपल्या पुत्राचा व सुनेचा वृत्तांत ऐकून त्याचे काळीजच गलबलले. तो सत्यलोकी गेला व ब्रह्मदेवाला म्हणाला, “हे विधाता! कृतवीर्य हा माझा पुत्र सुशील, सदाचारी आणि ईश्वर भक्त आहे. पण त्याला पुत्रसुख नाही, असे का?” ब्रह्मदेव म्हणाले, “हे राजा, तुझा पुत्र पूर्वजन्मी सोम नामक अंत्यज होता. तो लोकांना लुबाडून व प्रसंगी हत्या करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असे. एके दिवशी त्याने बारा ब्राह्मणांना ठार केले. त्या दिवशी माग कृष्ण चतुर्थी होती. त्याने दिवसभर काहीही खाल्ले नाही. रात्री चंद्रोदयाच्या सुमारास लुटलेले धन तो लपत-छपत घरी घेऊन आला. आपला पुत्र गणेश याला नावाने हाका मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. चंद्रोदयानंतर स्नान करून त्याने परिवारासह भोजन केले.
अशा प्रकारे माघातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्याच्याकडून नकळत उपोषण, गजाननाचे नामस्मरण व चंद्रोदयानंतर भोजन हे सगळे व्रताचरण घडले. त्या पुण्यप्रभावाने या जन्मी तो राजकुळात जन्माला आला. त्याला राजवैभव प्राप्त झाले, पण हातून घडलेल्या ब्रम्हहत्येमुळे त्याला संततीचे सुख लाभले नाही. म्हणून त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत आचरण करावे. या व्रतरुपी श्रीगणेश सेवेने त्याच्या पूर्व पातकांचा नाश होऊन त्याला पुत्रलाभ होईल.”
ते ऐकून कृतवीर्याच्या पित्यास परमानंद झाला. त्याने विधात्याकडून संकष्टी चतुर्थी व्रताचे सर्व विधी समजावून घेतले व मग कृतवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेनुसार कृत्यवीर्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या व्रतपुण्याइने गणपतीची कृपा होऊन त्याला एक पराक्रमी पुत्र झाला.
श्री गणेश पुराण कथा (ब)*
*संकष्टी चतुर्थी व्रत*
ज्या कोणाला गणपतीचे संकष्टी व्रत करावयाचे आहे, त्याने ज्या दिवशी माघ वद्य चतुर्थी मंगळवारी येते त्या दिनी व्रतास संकल्पपूर्वक आरंभ करावा. त्या दिवशी सकाळी लवकर उठावे. गणपतीचे नामस्मरण करावे. सायंकाळी तिळाचा किंवा आवळ्याचा कल्क लावून अभ्यंगस्नान करावे. धूत वस्त्र नेसावी. भाळी गंध लावावे. एकांतात आसनावर बसून गणपतीच्या एकाक्षर, षडक्षर किंवा गणानां त्वा या वैदिक मंत्राचा एकाग्रचित्ताने घटका दोन घटका जप करावा. पूजेची उपकरणे व साहित्य जुळवून गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी. त्याला उकडीचे किंवा माव्याचे मोदक, तिळाचे लाडू, करंज्या, घारगे अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. जास्वंदीचे फूल व एकवीस दुर्वा अर्पण कराव्या. कापूर प्रदीप्त करून मनोभावे आरती करावी. देवाला साष्टांग नमस्कार करावा. घरात शिजवलेल्या पक्वान्नांचा गणपतीला महानैवेद्य दाखवावा. चंद्रालाही नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे एक वर्षभर संकष्टी व्रत केल्याने गणपतीची प्रसन्नता लाभून उत्तम आणि सद्गुणी पुत्राचा लाभ होतो.
*मंगळाची कथा* , *अंगारकी चतुर्थी*
मंगळवारी येणाऱ्या कृष्ण चतुर्थीला अर्थात संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. क्षिप्रा नदीच्या काठी वसलेल्या अवंती नगरीत भारद्वाज ऋषींचा आश्रम होता. एके दिवशी ते स्नानासाठी नदीवर गेले होते. तेथे स्वर्गलोकी ची एक दिव्य अप्सरा जलक्रीडा करत होती. भिजलेल्या त्या सुंदर अप्सरेस पाहून भारद्वाज ऋषी कामपीडित झाले. त्यांचे तेज स्खलित झाले. खाली पडलेले ते वीर्य पृथ्वीने धारण केले. त्यापासून दिला लालबुंद, तेजस्वी असा पुत्र झाला. पितृ भेटीसाठी आतुर झालेला पृथ्वीचा तो पुत्र भारद्वाज ऋषींकडे जाण्यास निघाला. तेव्हा ती ही त्याच्या समवेत गेली. त्या दोघांनी भारद्वाज ऋषींची भेट घेतली.
पृथ्वीने त्यांना आधीची सर्व घटना सांगून पुत्राचा स्वीकार करण्याची विनंती केली. भारद्वाज ऋषींनी आपल्या तेजस्वी पुत्राला प्रेमाने जवळ घेतले. त्याला आपल्यापाशी ठेवले. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याला गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृआज्ञेने तो नर्मदातीरी गेला. तेथे अनुष्ठानास उपयुक्त असे एकांतस्थान शोधून तपश्चर्येस बसला. सहस्त्र वर्षे उलटून गेली तरी हे जपानुष्ठान चालू होते. त्याची तपोनिष्ठा पाहून गणपती परम संतुष्ट झाले. माघ वैद्य चतुर्थीच्या दिवशी त्यांनी भारद्वाज पुत्रास प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले, “वत्सा, तुझी तपश्चर्या पाहून मी फारच प्रसन्न झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घे.” तो म्हणाला, “देवा, तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुमची माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहो. तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात, ती ही माघ वद्य चतुर्थी तिथि लोकांना विशेष पुण्यफलदायी ठरावी अशी माझी प्रार्थना आहे.” गणपतीने ‘तथास्तु’ म्हणून आशीर्वाद दिला, व ते पुढे म्हणाले, “हे भरद्वाज पुत्रा, मी तुला ग्रह मंडळात स्थान देत आहे. तु मंगळ या नावाने ओळखला जाशील. पृथ्वीचा पुत्र म्हणून तुला भौम म्हणतील. तुझी अंगकांती अंगारा समान लालबुंद असल्याने तु अंगारक म्हणून प्रसिद्ध होशील.” त्याला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावले. भरद्वाज यांच्या तपस्वी पुत्राने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी एक भव्य मंदीर बांधले. त्यामध्ये दशभुजा गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. त्याचे *मंगलमूर्ती* असे नामकरण केले. कालांतराने मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला *अंगारकी चतुर्थी* म्हणण्याची प्रथा पडली.
*चंद्राला शाप*
एके दिवशी ब्रह्मदेव शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर गेले होते. योगायोगाने नारदांचे ही तेथे आगमन झाले. त्यांनी एक अपूर्व फळ आणले होते. ते त्यांनी शंकरांना दिले. ते फळ आपल्याला खावयास मिळावे म्हणून षडानन व गजानन शंकराच्या हाताला झोंबू लागले. त्यांचे भांडण पाहून शंकरांनी ब्रह्मदेवांना विचारले की फळ कोणाला देऊ? ब्रह्मदेवांनी कार्तिक स्वामींचे नाव घेतले. हा पक्षपात गणपतीला सहन झाला नाही. परंतु त्यावेळी गणपतीने कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही. ब्रह्मदेव सत्यलोकी परतले.
एके दिवशी गणपतीने महाभयंकर रूपात प्रकट होऊन ब्रम्हदेवांना भयभीत केले. ते प्राणभयाने व्याकूळ होऊन थरथर कापू लागले. त्यांची ती अवस्था पाहून चंद्राला मौज वाटली. चंद्राने गणपतीची देहयष्टी आणि त्यांच्या तोंडाची चेष्टा केली. मग आपल्याच विनोदावर तो खदाखदा हसू लागला. ती कुचेष्टा गणपतीला असह्य झाली. त्यांनी संतापाने चंद्राला शाप दिला, “मूढा, मला पाहून तु हसलास? माझ्या स्वरूपाची तू निंदा केली? या प्रेमाबद्दल त्रिखंडात कोणीही तुझे तोंड बघणार नाही. जो कोणी तुझ्याकडे पाहील त्याला मोठे पातक लागेल.” त्या शापवाणी चा तत्काळ प्रत्यय आला. चंद्राचे सुंदर मनोहर स्वरूप नष्ट होऊन तो कुरूप दिसू लागला. त्याचे सर्व तेजच लोपून गेले.
या घटनेमुळे चंद्र नैराश्याने ग्रस्त झाला व लपून बसला. त्यामुळे सृष्टीचक्रात मोठी बाधा उत्पन्न झाली. तेव्हा सर्व देवांनी गणपतीची भेट घेतली. चंद्राच्या वतीने त्यांची क्षमा मागितली व त्याला उ:शाप द्यावा अशी विनंती केली. गणपतीचा राग शांत झाला. ते म्हणाले, “भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माझा वार्षिकोत्सव साजरा केला जातो. त्या तिथीला जे कोणी चंद्राचे दर्शन घेतील त्यांच्यावर मोठी संकटे येतील. एरवी त्याच्या दर्शनाने काहीही त्रास होणार नाही.” गणपतीच्या आश्वासनाने देवांना मोठे समाधान वाटले. त्यांनी चंद्राची भेट घेऊन त्याला सर्व वर्तमान सांगितले.
त्यांच्या सांगण्यावरून चंद्र गंगेच्या दक्षिण तीरावर गेला. तेथे त्याने बारा वर्ष भक्तिभावाने गणपतीची आराधना केली. या सेवा भक्तीने संतुष्ट झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले, “हे रोहिणीपते! मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला पूर्व स्वरूप प्राप्त होईल. संकष्टी चतुर्थीला तुझ्या दर्शनाशिवाय लोकांच्या व्रताची सांगता होणार नाही. तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या मस्तकावर धारण करणार आहे. मात्र भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझ्या दर्शना बद्दल मी देवापाशी जे विधान केले आहे, त्यात काहीही बदल होणार नाही. त्या दिवशी तुझे दर्शन वर्ज्य मानले जाईल.” त्या वरदानाने चंद्राला पूर्वीप्रमाणे तेज प्राप्त झाले. त्याने आपल्या तपश्चर्येच्या स्थानी मस्तकावर चंद्र धारण केलेल्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते स्थान *सिद्धिक्षेत्र* म्हणून प्रसिद्ध झाले. दिलेल्या शब्दाप्रमाणे गणपतीने चंद्राची एक कला आपल्या भाळी धारण केली. त्यामुळे त्यांना *भालचंद्र* हे नाव प्राप्त झाले.
श्री गणेश पुराण कथा (क)*
*दुर्वा महात्म्य*
यमलोकात कसलातरी उत्सव होता व यमधर्माच्या निमंत्रणावरून देव, गंधर्व, श्रेष्ठ ऋषी आदी सर्व मंडळी त्याच्या सभेमध्ये जमली होती. तिथे मनोरंजनार्थ तिलोत्तमा अप्सरेचे नृत्य आयोजित केले होते. नृत्य करताना तिच्या कमनीय देहाची होणारी हालचाल व तिचे मादक सौंदर्य पाहून यम काम प्रेरित झाला. त्याने तिच्याशी एकांतात अंगसंग केला. त्याच्यापासून तिला एक राक्षस पुत्र झाला. त्याच्या दृष्टीने सर्वत्र आगी लागल्या. हजारो जीवांचा संहार झाला. त्याच्या गर्जनांनी त्रीखंडाला हादरे बसू लागले. त्या यमपुत्राच्या रूपाने सृष्टीवर मोठे संकटच ओढावले होते. याचे निवारण करण्यासाठी देव विष्णूला शरण गेले. विष्णूंनी त्यांना गणपतीकडे पाठवले. देवांनी गणेशलोकी जाऊन गणपतीची अपार स्तुती केली. त्या भयंकर दैत्याच्या उत्पातांची त्यांना कल्पना दिली आणि हे विघ्न निवारण करून जगाला वाचवावे अशी विनंती केली. गणपतीने त्या सर्वांना दिलासा दिला.
गणपतीने बालरूप धारण करून अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे त्यांच्या पोटात भयंकर आग भडकली. त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. तो पराक्रम पाहून देवांनी गणपतीचा जयजयकार केला. अनलासुराला पोटात दडपल्यामुळे गणपतीला फार त्रास होत आहे हे पाहून सर्वांनी त्याच्यावर अनेक प्रकारचे शितलोपचार केले. इंद्राने त्यांच्या मस्तकावर चंद्र ठेवला. विष्णूने शितल कमळे दिली, वरुणाने त्यांच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला, शंकराने सहस्त्रफणी नाग त्यांच्या स्थूल उदरावर बांधला. पण काहीही उपयोग झाला नाही. या उपचारांमुळे गणपती भालचंद्र, पद्मपाणि, सिद्धिविनायक, बुद्धीदाता, व्यालबद्धोदर अशा नावांनी प्रसिद्ध झाला.
त्यानंतर अठ्यांशी हजार ऋषींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची एक एक जुडी त्यांच्या मस्तकावर वाहिली. त्या दुर्वांनी त्यांच्या अंगातील दाह शोषून घेतला. त्यामुळे त्यांना एकदम बरे वाटू लागले. ते शांत व स्वस्थचित्त झाले. मग प्रसन्न होऊन ऋषीजणांना म्हणाले, “यापुढे मला दुर्वा अतिशय प्रिय असतील. जो कोणी मला दुर्वा अर्पण करील, त्याला सहस्त्र यागांचे, महादानाचे व तीर्थयात्राचे पुण्यफळ मिळेल. त्या नंतर देवांनी गणपतीची स्तुती केली. *कालानलप्रशमन* या नावाने त्यांचा गौरव केला. त्या सर्वांना आशीर्वाद देऊन बालरुपी गजानन अंतर्धान पावले. त्या ठिकाणी देवांनी एक मनोहर देवालय बांधून त्यात गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणेश *विघ्नहर गणपती* म्हणून प्रसिद्ध झाला.
*सहस्त्रार्जुनाची कथा*
कृतवीर्याने अत्री ऋषींचा मार्गदर्शनानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत मोठ्या निष्ठेने केले. त्याचे यथाविधी उद्यापन ही केले. या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्याची राणी सुगंधा हिने एका पुत्राला जन्म दिला. हा मुलगा अतिशय सुंदर होता पण त्याला हात पाय नव्हते. त्या अपंग बालकाला पाहून राजा-राणीला शोक अनावर झाला. कृत्यवीर्याच्या प्रधानाने त्या दोघांचे सांत्वन केले. तो राजाला म्हणाला, “महाराज, हा पुत्र आपल्याला मोठ्या तपश्चर्येने लाभला आहे. काळ हेच सर्व वेदांवरचे बहुगुणी औषध आहे. श्री गणपतीच्या कृपेने सर्व काही ठीक होईल.”
कृतविर्याने कसेबसे आपले मन आवरले. ब्राह्मणांना बोलावून त्या बाळाचे जातकादी संस्कार करविले. बाराव्या दिवशी त्याचे बारसे केले. त्याचे कार्तवीर्य असे नाव ठेवले. अशी बारा वर्षे लोटली. एक दिवस भगवान दत्तात्रेय महाप्रभू राजाला भेटण्यासाठी आले होते. राजाने त्यांचे उत्तम स्वागत केले. आपल्या अपंग पुत्राला त्यांच्या चरणांवर घातले. दत्तात्रेयांनी कार्तवीर्याचे अंतरदृष्टीने अवलोकन केले. मग ते राजाला म्हणाले, “कृतविर्या, संकष्टी चतुर्थीचे व्रत करताना तू रात्रीच्या वेळी जागरण करत होतास. त्या प्रसंगी जांभई आली असता तू आचमन केले नाहीस. त्यामुळे तुला असा पुत्र झाला आहे. पण काळजी करू नकोस. मी याला एकाक्षर मंत्राचा उपदेश देतो. या मंत्रांचे त्याने बारा वर्ष भक्तिपूर्वक अनुष्ठान करावे. त्यायोगे गजाननाची प्रसन्नता लाभुन हा अव्यंग होईल. दत्तात्रयांच्या वचनांनी राजाला मोठे समाधान वाटले. कार्तवीर्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून श्री दत्तात्रेय महाप्रभु विश्वसंचारार्थ निघून गेले.
दत्तात्रेयांनी अनुग्रह दिल्यामुळे कार्तवीर्य धन्य धन्य झाला. त्याच्या मनात तपश्चर्येची उत्कट इच्छा निर्माण झाली. एकांतवासात राजपुत्राने मंत्र अनुष्ठान आरंभ केला. त्याने वायू भक्षण करून बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. या आराधनेने गणपती प्रसन्न झाले. त्यांनी कार्तवीर्याला दर्शन देऊन त्यास वर मागण्यास सांगितले. कार्तवीर्याने शीर्ष झुकवून त्यांना वंदन केले व म्हणाला, “गणाधिपा! तू दर्शन दिलेस यातच सर्व काही आले. तथापि माझ्या मातापित्याला बरे वाटावे म्हणून तु मला अव्यंग कर.” गणपतीने कार्तवीर्यवर कृपादृष्टी टाकून त्यास सहस्त्र हात व दोन पाय दिले. त्यामुळे त्याला फारच आनंद झाला. त्यांनी दत्तात्रयांचे ही गुणगान केले. त्याचे *सहस्त्रार्जुन* असे नाव ठेवले.
कार्तवीर्याच्या तपश्चर्येची अशी उत्तम सांगता झाली. त्या स्थानी त्याने एक भव्य मंदिर उभारले. त्यात प्रवाळाच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती *प्रवाळगणेश* म्हणून प्रसिद्ध झाला. प्राचीन काळी याच ठिकाणी शेषाने गणपतीची उत्कट आराधना केली होती. त्या योगे त्याला पृथ्वीचा भार धारण करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले होते, म्हणून त्या गणपतीला *धरणीधर* असेही म्हणतात. कार्यसिद्धी झाल्यावर कार्तवीर्य म्हणजेच सहस्त्रार्जुन आपल्या नगरात परतला. त्याचे नूतन रूप पाहून प्रजाजणांना व राजा-राणीला परमानंद झाला.
*इंद्राचे विमाने अमरावतीस पोहोचले व राजा शुरसेनास गणेश लोकांची प्राप्ती झाली.*
एका चंडालीकेस कडून गणेश चतुर्थी व्रताचे नकळत पणे आचरण घडले, त्या पुण्य प्रभावामुळे गणपतीने तिला आणावयास दिव्य विमान पाठवले. त्या विमानातून जात असताना तिची दृष्टी इंद्राच्या बंद पडलेल्या विमानावर पडली. तिची दृष्टी पडताच त्याचे विमान चालु झाले व आकाशात झेपावले.
इंद्राकडून संकष्ट चतुर्थी चे सर्व महात्म्य ऐकल्यानंतर शूरसेनाने कुलगुरू वशिष्ट यांची भेट घेतली. त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. राजाच्या मनात गणेश चतुर्थीचे व्रत करण्याची तीव्र इच्छा आहे हे लक्षात घेऊन वसिष्ठांनी त्याच्याकडून गणेश पूजन आणि व्रत संकल्प करून घेतला. त्याला मंत्रोपदेश केला. राजाने चतुर्थी व्रताचे मनःपूर्वक आचरण केले. मग यथाविधी उद्यापन ही केले. त्याच्या व्रतसेवेने गणपती अतिशय प्रसन्न झाले. त्याने राजाला गणेश लोकी आणण्यासाठी दिव्य विमान पाठवले.
ज्या श्वेतकुष्ठ झालेल्या सेवकाच्या दृष्टीमुळे इंद्राचे विमान बंद पडले होते , त्या सेवकाच्या पूर्वजन्मीच्या पाप कर्मांमुळे त्याला ह्या जन्मी श्वेतकुष्ठ झाले होते. शूरसेन राजाने त्याला ‘गजानन’ नाममंत्राचा उपदेश केला , तर काय आश्चर्य! त्या मंत्रामुळे त्याचे सर्व कुष्ट नाहीसे होऊन त्याची अंगकांती उजळली व तो सेवकही राजा समवेत गणेशलोकी गेला.
श्रीगणेश*
भाग - १४.
देवाने भक्ताची हाक एकली.अचानक दिव्य सुगंधाने वातावरण भरुन आले. दाराचे कुलुप निखळुन खाली पडले... आणि तांबड्या फुलांनी सुंदर सजवलेले मयूरेश्वर मोरया जिथे बसला होता तीथे आले. हर्षभराने मोरयाने , गद्गदीत होऊन मयूरेश्वराला साष्टांग प्रणिपात केला. मयुरेश्वरांनी त्याल आशिर्वाद देऊन त्याच्या जवळच तीथेच बसले.
सकाळी पुजार्याला गाभार्यात बाप्पा नाही हे पाहुन त्याची पाचावर धारण बसली, गाळण ऊडाली त्याची. गांवकरी काय म्हणतील? बाप्पाच देवळात नसेल तर चाकरी करायची कोणाची? पुजारी गर्भगळीत होऊन बाहेर आला! बघतो तर काय? मोरया कोणाशी तरी गप्पा मारतांना दिसले, समोर दिसत तर कोणीच नाही, अचानक पुजार्याच्या मनी शंका उद्भवली, गाभार्यातील बाप्पा बाहेर तर आले नसतील ना? पुजार्याने मोरयाच्या पायाला मिठी मारीन कळवळून क्षमायाचना केली. पुजार्याची केविलवाणी अवस्था पाहुन बाप्पा परत गाभार्यात स्वस्थानी प्रविष्ट झाले. मोरया गोसाव्यामुळे पुजार्याला मयुरेश्वराचा आवाज ऐकण्याचे भाग्य लाभले.
मोरया मोरगांववरुन चिंचवडला आले. षष्ट्यद्विपूर्ती, अमृतमहोत्सव हे टप्पे पार करुन मोरयाचं वय शहाणणवच्या पायरीवर येऊन ठेपले.मोरया मठात बसलेले असतांना ताथवडचे गोविंद कुळकर्णी नांवाचा वधुपिता म्हणुन भेटायला आले. मोरयाने भेटीचे कारण विचारले असतां, कुळकर्णी म्हणाले की, त्यांच्या स्वप्नात त्यांची कुलस्वामीं येऊन आदेश दिला की, मुलीचे लग्न मोरया गोसाव्याशी करावे. मुलीला या विवाहाबद्दल विचारल्यावर मुलगी सुध्दा विवाहाला तयार आहे. त्यावर मोरया म्हणाले, तुमच्या प्रमाणे देवाने मलाही आदेश द्यायला हवा!
त्याच रात्री थेऊरचे चिंतामणी मोरयाच्या स्वप्नात येऊन कुळकर्णीच्या मुलीशी विवाह करण्याचा आदेश दिला. तिच्या उदरी मी जन्म घेणार आहे. त्यावर मोरयांनी विचारले, गणराया! ते मुल आपंणच आहांत याची काय खुण असेल? चिंतामणी म्हणाले, त्या मुलाच्या ह्लदयावर शेंदरी रंगाची पांच बोटे उमटलेली राहिल आणि जन्मकाळी तो रडणार नाही. हे ऐकल्यावर मोरयाचे मन स्थीर झाले, आपल्या घरी थेऊरचा देव येणार यामुळे त्यांना अतिशय आनंद होऊन मन निःशंक झाले. त्यांनी कुळकर्णीना होकार कळवला. लवकरच एका शुभ मुहुर्तावर ९६ वर्षाच्या मोरया गौसाव्याच्या गळ्यात उमानं वरमाला घातली. यथावकाश सौ. ऊमाबाईने एका पुत्ररत्नास जनम दिला. जन्मताक्षणीच रडण्याच्या आवाजाऐवजी ओंकार स्वर निघाला छातीवर सिंदुरवर्णाची पांच अंजुळे उमटलेली होती. पुत्राचं नांव चिंतामणी ठेवले .
एकदा मयूरेश्वराने मोरयाच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, मी स्वतःच चिंचवडला येईन. इ. स. १९४२ मधे मासिक वारीच्या निमित्याने मोरगांवला आल्यावर कर्हानदीत स्नान करुन सुर्याला अर्ध्य देत असतांना अचानक त्यांच्या हाताला पाषाणाचा स्पर्श जाणवला, बघीतलं तर स्वयंभू गणपती.... मध्यम आकार, शुंडा आणि नेत्र मयूरेश्वराची आठवण करुन दिली. मोरयाचे अंतःकरण गदगद होऊन डोळे आनंदाश्रुने भरुन आले.
श्रीगजाननाची प्रासादिक मूर्ती घेऊन कोठेरेश्वराच्या जवळच चिंचवडला मंगलमूर्तीचि प्रतिष्ठापना केली. मोरया फक्त जेष्ठ, भाद्रपद व माघात तीनदाच मोरयाची वारी करुं लागले. एकदा मोरया डोळे मिटुन ध्यानस्थ बसले असतां, डोळे उघडल्यावर बघतात तर समोर सद्गुरी नयनभारती! गुरुशिष्य एकमेकांना कडकडुन भेटल्यावर मोरयांनी सांगीतले की, श्रीगणेशप्रबोधिक ग्रंथ्रांचे काम पुर्ण झाले. ग्रंथाचे वाचन झाल्यावर नयनभारती समाधान पावले, प्रसन्नपपणे ते म्हणाले, "श्रीगणेशप्रबोधिक" हा ग्रंथ विचारवैभव, शब्दसौंदर्याने उत्कृष्ट व अप्रतिम आहे. निवृत्तदिसूच्या ज्ञानेश्वरीप्रमाणे तुझी "गणेश्वरी" त्रिभुवनविख्यात होईल. भृशूंड, गृत्समद, मुद्गल यांच्या योग्यतेचा असुन निर्लोभी, निर्मोही शिष्य लाभल्याने मी कृतार्थ झालो. शक्ती संक्रमित करण्याचा अधिकार तुला देतो आहे. योग्य वेळ पाहुन चिंतामणीस दिक्षित कर!
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*श्रीगणेश*
भाग - १५.
पुढे धीरगंभीर आवाजात नयनभारती म्हणाले, श्रीगणेश हा विद्याधिपती, सेनापती, विनायक आहे म्हणुन ज्ञान आणि शौर्य संपादन करण्याचा सतत प्रयत्नशील रहा. असे म्हणुन ते अंतर्धान पावले.
भगव्या वेशातील तेजःपुंज्य मोरया गोसावी गुंफेकडे जात असतांना त्यांचा मुलगा चिंतामणी आपल्या दोन भार्यासह त्यांच्या सोबत गुहेत आले. चिंतामणींनी आपल्या भार्यासह त्यांची षोडपचारे पुजा केली. मोरयाने आपली दृष्टी भूमध्यभागी खिळवली. त्यांच्या धमण्यांतुन मयूरेश्वराच्या नामाचा जप सुरु असतांनाच मोरया पंचतत्वात विलीन झाले. सर्वानीच शोकाकुल स्थीतीत, जड अंतःकरणाने त्यांचा अखेरचा निरोप घेतला.
ॐपुर्ण मिदं पूर्णमदः पूर्णात पूर्णभुदच्येत। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाव शिष्यते।।"
गणपती हे जनसामान्याचं दैवत! त्याच्या स्वरुपात पर
ब्रम्हाचा साक्षात्कार होतो. ज्ञानेश्वरांना गणपतीच्या ठायी वेदप्रतिपाद्य आत्मस्वरुप दिसलं तर रामदास स्वामींना केवळ दर्शनमात्रे मनोकामना पुरवण्याचं आगळं सामर्थ्य जाणवलं. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ पुण्यात रोवली ती प्रथम गजाननाची स्थापना करुनच! पेशवांनी तर श्रीगजाननाच्या आश्रयानेच राज्यशकट चालविला.
गणपती हा वेळेनुसार वागणारा देव आहे. अश्मयुगात स्वतःच्याच मोडलेल्या दाताने लढला, तर लोहयुगात परशू व अंकुश धारण केलं तर कलीयुगात धुम्रवर्ण म्हणुन ओळखला जातो. तोच कर्ता करविता आहे. कला कौशल्याचा निर्माणकर्ता, रणांगणात नेता, त्रृषींचा शिक्षक, संकटग्रस्तांचा त्राता आहे. "ब्रम्हणस्पती" असा उल्लेख वेदातही आढळतो. पुरांणांचे निर्माते वेदव्यासमुनींनी गणपतीचे पुजन केल्यावरच निर्विघ्नपणे सर्व पुरानांची रचना केली. जो विश्वाला व्यापुन आपल्या शरीरात आत्मरुपाने वास करतो तो गणपती! आत्मस्वरुपाचं ज्ञान होणं म्हणजेच श्रीगणेशाचे ज्ञान होणे होय. गणपती म्हणजे वेदांचा ईश्वर! मंगल करणारा देव!
एकदा लोमेशत्रृषी एका मुक्या मुलाला घेऊन ब्रम्हदेवाकडे गेले असतां ब्रम्हदेवाने लोमेशत्रृषींना 'गणेशपुराण' सांगीतले. ते त्या मुक्या मुलाने ऐकल्यावर तो "गणेशपुराणाचा" उत्कृष्ट वक्ता झाला. त्या मुलाने इश्वाकु कुळातील एका संततीहिन राजाला गणेशपुराण ऐकवल्याने राजाला पुत्रप्राप्ती झाली.
एकदा पार्वती अपल्या मैत्रीणींसोबत स्नान करीत असतांना अचानक महादेव आंत आले. परंतु आतले दृष्य पाहुन आल्यापावली परत फिरले. पहार्यावर असलेल्या नंदिची पार्वतीने चांगली खरडपट्टी काढली. मैत्रीणी पार्वतीला म्हणाल्या, तुला महादेवाचा वर आहे ना की, एखादी वस्तु तयार केली व मंत्र म्हटला की त्यात प्राण येतो, तर तु एखादी मूर्ती तयार कर! महादेवाचे स्मरण केल्यावर ती मुर्ती सजीव होईल व फक्त तुझीच आज्ञा पाळेल. पार्वतीने एक पुतळा तयार केला. भोलेनाथाने दिलेला मंत्र म्हटल्याबरोबर मुर्ती सजीव झाली. तोच पुढे तीचा पुत्र गणेश म्हणुन प्रसिध्द झाला.
एकदा पार्वती त्याला म्हणालि मी स्नानास जाते, कोणालाही आंत सोडु नकोस. पार्वतीची आज्ञा शिरसावंद्य माणुन तो दार अडवुन पहारा देऊ लागला. थोड्या वेळाने शंकर येऊन आंत जाऊ लागले असता याने त्यांना आंत जाण्यास मज्जाव केला, त्यामुळे शंकराने चिडुन क्षणार्धात त्रिशुलानं त्याचे मस्तक धडावेगळं केलं. पार्वती स्नान करुन आल्यावर मुलगा गतप्राण झालेला पाहुन तीने आकांत केला. मुलागा जिवंतहोईस्तोवर मी अन्नत्याग करीन अशी प्रतिज्ञा केली. शंकराने गणांना आज्ञा केली की, एखाद्या मुलाचं शीर किंवा जे प्रथम दिसेल त्याचे मस्तक कापुन आणा. गणांना प्रथम दिसलेल्या हत्तीचे मस्तक आणले. शंकरांनी धडावर शीर ठेवुन कमंडलुतले पाणी त्याच्यावर शिंपडल्याबरोबर ते बालक जिवंत झाले. त्याचेच नांव गजानग ठेवले.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
दैनिक देव-पूजा संकल्प*
२|०९|२०२५
*देशकालोच्चार*
श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथम चरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भारतखंडे दंडकारण्ये देशे आर्यावंतातर्गत ब्रह्मावैर्तकदेशे रामक्षेत्रे परशुरामाश्रमे शालिवाहन शके विश्वावसु नाम संवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्ल पक्षे, दशमी तिथौ, भौम वासरे, मूळ नक्षत्रे प्रीति योगे, तैतिल करणे धनु राशीस्थिते श्रीचंद्रे, सिंह राशिस्थिते सूर्य, मिथुन राशिस्थिते श्रीदेवगुरौ, शेषेषु ग्रहेषु यथायथं राशि स्थानानि स्थितेषु सत्सु एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ,
(स्वतःचे गोत्र नाव उच्चार करावा.)
मम आत्मन: श्रृती स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं, दीर्घायुः पुष्टि धनधान्य समृध्यर्थम्, सर्वापत्तिनिवृत्ति सर्वाभिष्टफलावाप्ति धर्मार्थ काममोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिध्यर्थम्, सकल दुरितक्षयद्वारा अभिष्टफलप्राप्तर्थ्यं -----
देवताप्रीत्यर्थं यथामिलीतोपचारद्रव्यै र्ध्यानावाहनादि पूजनं अहं करिष्ये |
तदंगत्वेन भूमिपूजन असनशुध्दि, दिग्रक्षणं, कलशार्चनं, दीपार्क पूजन, शंख घंटा पूजन करिष्ये ।
आदौ गणेशवंदनं ।।
*विशेष सुचना - हा संकल्प केवळ दैनिक घरगुतीख पूजेसाठी आहे. नित्यपूजेमध्ये आपणं तत्कालीन चिंता निवारणासाठी देवाला प्रार्थना करत असतो. त्यामुळे दैनिक संकल्पात अवश्यक असा संकल्प शास्रशुध्द दिलेला आहे. नैमित्तिक कर्मासाठी वेगवेगळे संकल्प असतात, त्यामुळे त्या नैमित्तिक कर्माचा संकल्प त्या त्या उपासनेनुसार करावा.*
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
*परशुरामाची कथा*
ब्रह्मदेवांनी व्यासांना गणपतीच्या संकष्टी चतुर्थआदी व्रतांबद्दल सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर त्यांना गणेशभक्तीपर अनेक कथा सांगितल्या. सर्वप्रथम त्यांनी जमदग्नी-रेणुकेचा पुत्र, विष्णूंचा अवतार, परशुराम याची कथा सांगितली.
परशुरामाने लहानपणी पित्यापाशी राहूनच विद्याभ्यास केला. वेदाध्ययन झाल्यावर ते तपश्चर्येसाठी अरण्यात निघून गेले.एके दिवशी सहस्त्रार्जुन आपल्या सैनिकांना समवेत शिकारीसाठी निघाला. तो श्वेतद्वीपातील वनात श्वापदांच्या मागे भटकू लागला. मध्यान्समयी तो जमदग्नी ऋषींच्या आश्रमापाशी आला. त्याने त्यांचे दर्शन घेतले. ऋषींनी त्याचे यथोचित स्वागत केले. जमदग्नी ऋषींच्या सांगण्यावरून सहस्रार्जुन स्नानासाठी गेला.
त्यानंतर जमदग्नी ऋषींनी कामधेनुला वंदन केले. तिला सहस्त्रार्जुन व त्यांच्या सैनिकासाठी भोजन देण्याची विनंती केली. कामधेनु ने उत्तम प्रकारे भोजन उत्पन्न केले. ती व्यवस्था पाहून सहस्त्रर्जुनाला मोठे नवल वाटले. तेव्हा त्याने ऋषींना विचारले, “ऋषीजी, ही सर्व व्यवस्था तुम्ही कशी काय जुळवून आणलीत?” जमदग्नी सहजतेने म्हणाले, “राजा, माझ्या आश्रमात कामधेनु आहे. तिच्या कृपेनेच या सर्व गोष्टी साध्य झाल्या.” ते रहस्य कळताच सहस्त्रार्जुनाच्या मनात कामधेनूची अभिलाषा निर्माण झाली. तो म्हणाला, “ऋषी, तुम्हाला कामधेनूचा कितीसा उपयोग होतो? माझे राज्य मोठे आहे, मलाच तिचा जास्त उपयोग होईल. तुम्ही कामधेनूला माझ्या स्वाधीन करा अशी माझी आज्ञा आहे.”
जमदग्नी ऋषींना पुढील अनर्थाची कल्पना आली. ते सहस्त्रार्जुनास म्हणाले, “तु सज्जन आहेस. राजाने व तत्सम अन्य कोणीही ब्राम्हणांच्या संपत्तीचे हरण करू नये ,त्याचे रक्षण करावे असे शास्त्र सांगते. तुझा सन्मान करून मी स्वतःवरच संकट ओढवून घेतले आहे.” जमदग्नी ऋषींचे बोलणे ऐकून सहस्रार्जुनास राग आला. तो आपल्या सैनिकांना म्हणाला, “बघता काय? जा ,या आश्रमाच्या गोठ्यात बांधलेल्या कामधेनुला घेऊन या.” सैनिकाने कामधेनुला धरून आणले. ती मोठ्याने हंबरू लागली. तिची अवस्था पाहून ऋषींच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी तिला हात जोडले व म्हणाले, “माते,तुझे रक्षण करण्यास मी असमर्थ आहे. आता तूच या दुष्टाला धडा शिकव.” तेव्हा कामधेनुच्या सर्वांगातून सहस्त्रावधी सैनिक उत्पन्न झाले. त्यांनी सहस्त्रार्जुनाच्या सर्व सैनिकांचा वध केला.
हे सर्व डोळ्यांदेखत घडलेले पाहून सहस्त्रार्जूनाला अधिकच चेव चढला. त्याने आश्रमात घुसून जमदग्नी ऋषींची निंदा केली. त्यानंतर संतापाच्या भरात त्यांचा वध केला. पती निधनाने आक्रोश करणार्या रेणूका मातेला हि त्याने एकवीस बाण मारून विध्द केले. तेव्हा तिने त्याला शाप दिला, “अरे नराधमा, तू माझ्या सौभाग्याचे हरण केलेस, त्याप्रमादाबद्दल माझा पुत्र परशुराम तुला चांगलीच शिक्षा करेल. तुझे सामर्थ्य असलेल्या या भुजाच तो तोडून टाकेल.”
या सर्वात कामधेनु अदृश्य झाली. तिच्या लोभापायी आपल्या हातून ब्रह्महत्या घडली, त्याच्या साध्वी पत्नीने आपल्याला शाप दिला, म्हणून सहस्त्रार्जुन व्यतीथ झाला. शोकाकुल रेणुका माता एकसारखी रडत होती. त्यामुळे तपोमग्न परशुराम भानावर आले. आश्रमात काहीतरी विपरीत घडले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. ते त्वरेने तेथे आले. आपल्या पित्याला मृत अवस्थेत व मातेले जखमांनी तळमळताना पाहून त्याचे हृदय विदीर्ण झाले. परशुरामाची तगमग पाहून रेणुका धापा टाकत म्हणाली, “बाळा, जे घडायचे ते घडून गेले आहे. त्या दुष्ट सहस्त्रार्जुनास तू चांगली शिक्षा कर. त्याला जन्माची अद्दल घडव. त्याने मला एकवीस बाण मारले, याच्या निषेधार्थ तू एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय कर.
परशुरामाला शोकावेग आवरेना,तेव्हा दत्तात्रेयांनी तेथे प्रकट होऊन त्यांचे सात्वन केले. त्यांच्याच सूचनेनुसार परशुरामाने आपल्या माता-पित्याचे दहानादी उत्तरकार्य केले. रेणुका मातेने आपल्या पुत्रास शंकराची आराधना करण्यास सांगितले त्यानुसार परशुरामाने कैलासावर जाऊन शिवस्तुती केली. त्यांना वस्तुस्थिती सांगून सहाय्य करण्याची विनंती केली. भगवान शंकर म्हणाले, “परशुरामा, तू गणपतीची आराधना कर.” शंकराने परशुरामाला गणेशाय नमः या मंत्राचा उपदेश केला. आराधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले.
परशुरामाने कृष्णा नदीच्या उत्तरेकडील अरण्यात निवास केला. तेथील शांत वातावरणात त्यांनी एकाग्रचित्ताने व अनन्यभावाने शिवोपदिष्ट गणेश मंत्राचा लक्ष संख्येत जप केला. प्रसन्न झालेल्या गणपतीने त्यांना सगुण-साकार रूपात दर्शन दिले. कार्यसिद्धीसाठी स्वतःचा परशू दिला. यशस्वी भव! असा आशीर्वाद देऊन ते अदृश्य झाले. परशुरामाने स्वतःच्या तपश्चर्येच्या स्थानी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती *मयुरेश्वर* म्हणून विख्यात आहे. कालांतराने त्याच स्थानी गजाननाने कमलासुर नामक दैत्याचा वध केला. परशुरामाचे आधीचे नाव भार्गवराम, पण गणपतीने परशु दिल्यानंतर ते परशुराम म्हणून मान्यता पावले. गणेश कृपेने त्यांना मोठे सामर्थ्य प्राप्त झाले.
परशुरामाने सहस्रार्जुनाला युद्धाचे आव्हान दिले. त्या युद्धात सहस्त्रार्जुनाचा पराभव करून परशुरामाने त्याचे दोन हात ठेवून बाकीचे सर्व हात छेदले. पुढील काळात जेव्हा जेव्हा क्षत्रियांचे प्राबल्य वाढले तेव्हा तेव्हा परशुरामाने त्यांचा संहार केला व मोठा यज्ञ करून पृथ्वी ती ब्राह्मणांना दान दिली. अशा प्रकारे त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून माता रेणुकेला दिलेला शब्द पाळला.
*श्री गणेश पुराण कथा (ब)*
*कार्तिकेय जन्माख्यान, तारकासुराचा वध*
ब्रह्मदेव व्यासांना गणेशभक्तीपर दुसरी कथा सांगू लागले.
फार पूर्वी तारकासुराने तीव्र तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने त्याला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला, “हे विधाता! मी अजिंक्य व्हावे.” ब्रम्हदेव म्हणाले, “शिवपुत्र कार्तिकेय शिवाय कोणतेही देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस व मनुष्य तुझा वध करू शकणार नाही.” या वरदानाने तारकासुर बलाढ्य झाला. त्याने उन्मत्तपणे त्रैलोक्यात थैमान घातले. तारकासुराच्या वधासाठी ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा ‘भगवान शंकराचा पुत्र तारकासुराचा नाश करेल’ अशी आकाशवाणी झाली. म्हणून सर्व ऋषी देवांसह कैलासावर आले.
शिवपुत्राच्या उत्पत्ती कार्यासाठी मदनाने शंकराच्या भोवताली सुरम्य नंदनवन तयार केले. त्यानंतर मदनाने आपल्या भात्यातील अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण बाणाने शंकराच्या मनाचा वेध घेतला. त्यामुळे त्यांची समाधी भंगली.त्यांनी डोळे उघडले. अंतर्ज्ञानी शिवाने मदनाचे कपट तात्काळ ओळखले. त्यांनी संतापाने तृतीय नेत्र उघडून त्याला क्षणार्धात भस्मसात केले. तारकासुराच्या छळाला कंटाळलेले सर्व देव शंकरांना शरण गेले, तेव्हा शंकरांनी आपले तृतीय नेत्र मिटून घेतले. देवांकडून त्यांचे सर्व वर्तमान जाणून घेऊन त्यांनी देवाचे सांत्वन केले. ‘मी तुमचे कार्य करतो’ असे आश्वासन देऊन ते पार्वतीसह कैलासावर निघून गेले.
तेथील एकांतात ते दोघे रतीक्रीडेत रममाण झाले. अशी सहस्त्र वर्षे लोटली. कैलासावरून शिवपुत्राच्या जन्माची वार्ता ऐकण्यास सर्व देव उत्सुक झाले होते, पण तसे काही घडले नाही. तेव्हा त्यांनी अग्नीला पाचारण केले. त्याप्रमाणे अग्नी याचक रूपाने कैलासपर्वतावर गेले. शिवपार्वतीच्या क्रीडाभवनाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून ‘रतीक्रीडेत मग्न असलेल्या शंकरांचे दिव्य तेज स्खलित झाले ‘ अग्नीने ते शिवतेज स्वतः धारण केले. त्यामुळे त्यास गर्भ राहिला. गंगा हि शिवाची अर्धांगिनीच आहे, असा विचार करून त्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या उदरातील गर्भ तिच्या प्रवाहात सोडून दिला. तो कार्तिक मास होता.
कृतिका नामक सहा स्त्रिया स्नानासाठी गंगेवर आल्या होत्या. अग्नीने आपला गर्भ गंगेत सोडल्यावर प्रवाहाच्या वेगाने त्याचे सहा भाग झाले. हे सहा भाग त्या सहा ऋषी स्त्रियांच्या गर्भाशयात प्रवेशले. त्या गरोदर राहिल्या. त्यांनी घरी जाऊन आपापल्या पतींना सर्व वर्तमान सांगितले. त्यांनी ‘तुम्ही गर्भ त्याग करून आल्याशिवाय, तुम्हाला घरात प्रवेश नाही’ असे स्पष्ट बजावले. त्या पुन्हा गंगेवर गेल्या. त्यांनी आपले गर्भ योगमार्गाने बाहेर काढून प्रवाहात विसर्जित केले. ते सहा भाग पुन्हा एकत्र झाले. त्यांच्यापासून सहा शिरे, बारा हात व दोन पाय असलेला एक दिव्य बालक उत्पन्न झाला.
गंगा स्नानासाठी आलेल्या नारदांचे त्या कडे लक्ष गेले. अंतर्ज्ञानी देवार्शींनी हा शिवपुत्र आहे हे तात्काळ ओळखले. त्यांनी गंगेला त्या पुत्राची काळजी घेण्यास सांगितले. मग ते त्वरेने कैलासावर गेले. तेथे शिवपार्वतीला पुत्रजन्माचे शुभ वृत्त सांगितले. आपल्या बाळाला बरोबर घेऊन पार्वती कैलासावर आली. निज पुत्राला पाहताच शंकरांचे पितृसुलभ वात्सल्य जागे झाले. त्यांनी त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर खेळवू लागले.
भगवान शंकरांना पुत्र झाल्याचे वर्तमान हा हा म्हणता म्हणता सर्वत्र पसरले. सर्व देव कैलासावर त्या पुत्रास पहावयास आले. ब्रम्हदेव आणि बृहस्पती यांनी त्याला अनेक नावांनी अलंकृत केले. कार्तिकात जन्म झाला म्हणून त्याचे कार्तिकेय हे नाव ठेवण्यात आले. भगवान शंकरांचे वीर्य त्रिवार स्कन्न झाले म्हणून स्कंद. पार्वतीचा पुत्र म्हणून पार्वतीनंदन. सहा कृतीकांनी त्याला गर्भ रूपाने धारण केले म्हणून षण्मातुर. शर नावाच्या तृणात गर्भ एकवटून त्याचा जन्म झाला म्हणून शरजन्मा. तारकासुराचा वध करणारा म्हणून ताराकाजित आणि देवांचा सेनापती म्हणून महासेन व सेनानी.अशा प्रकारे त्याला अनेक नावाने संबोधणे प्राप्त झाली.
इंद्रादी देवांनी त्या शिवपुत्राला तारकासुराच्या अत्याचाराची पूर्ण कल्पना दिली. त्याचा संहार करून त्रिभुवनाला संकटमुक्त करण्याची विनंती केली. त्याला देवांचा सेनापती म्हणून घोषित केले. कार्तिक दिसामासाने लहानाचा मोठा होऊ लागला. तो महाविद्वान होता. तो अल्पावधीतच सर्व ज्ञानसंपन्न झाला. त्याची शस्त्रास्त्र विद्या वाखाणण्यासारखी होती. बालपणापासूनच त्याचे क्षात्रतेज जाणवत होते. एके दिवशी कुमार शंकरांना म्हणाला, “पिताश्री, तुम्ही मला आजपर्यंत अनेक प्रकारचे ज्ञान दिले. मला अनेक कथा, व्रते, उपासना, मंत्र व त्याच्या अनुष्ठाने, क्षेत्रांचे व तीर्थांचे महत्त्व या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली. आता ज्यायोगे शत्रूवर विजय मिळवता येईल आणि माझी त्रिभुवनात कीर्ती होईल असे एखादे व्रत असल्यास सांगा. मी त्याचे निष्ठेने आचरण करेन.” ते ऐकून शंकराना आनंद झाला. ते म्हणाले, “कुमार, तु गणपतीचे वरद चतुर्थी व्रत कर. हे व्रत शत्रूंचा व संकटाचा नाश करणारे, सर्व मनोरथांची पूर्तता करणारे व कीर्तीसह मानसन्मान मिळवून देणारे आहे.
शंकराने कुमाराला गणेश चतुर्थी व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे त्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या गणपतीने मयुरारूढ स्वरूपात त्याला दर्शन दिले. त्याला अनेक वर दिले. स्वतःचे मयुर वाहन हि देऊ केले. तेव्हापासून कुमाराला *मयूरध्वज* हे नाव प्राप्त झाले. गणपतीच्या कृपाप्रसादाने स्कंदाला मोठे मनोधैर्य लाभले. त्याने देवांना संघटित केले. युद्धाच्या योजना आखल्या. सर्व सिद्धता झाल्यावर त्याने गणपतीची पूजा केली. माता-पित्याचे व ऋर्षी जणांचे आशीर्वाद घेतले. पुढे एका सुमुहूर्तावर त्याने ताराकासुरावर स्वारी केली. त्या युद्धात त्याने दैत्यांची प्रचंड हानी करून तारकासुराला ठार केले. सर्वांनी कुमाराचा जयजयकार केला. स्कंद आणि तारकासुर यांचे युद्ध झाले ते स्थान लक्षनगर म्हणून प्रसिद्ध आहे. जेथे गणपतीने स्कंदाला दर्शन व वरदान दिले तेथे घृसुनेश्वर व लक्षविनायक अशी दोन पुण्यक्षेत्र निर्माण झाली.
[01/09, 11:19 pm] +91 83290 19361: *श्री गणेश पुराण कथा (क)*
*रती आणि मदन*
ब्रह्मदेवाने व्यासांना गणेशभक्तीपर तिसरी कथा सांगितली.
शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून मदनाला भस्म केले. पती निधनाचे कळताच रतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. ती आक्रोश करत शिवापाशी गेली. तिने करुणा वचनाने त्यांना आळविले. ती त्यांना एक सारखी विनवणी करू लागली. शंकराने तिच्याकडे करुणामय दृष्टीने पाहिले. मृदू शब्दाने तिचे सांत्वन केले. ते म्हणाले, “हे रती, जे घडले ते विधीचे अटळ विधान होते. पण तु ज्या ज्या वेळी मदनाचे स्मरण करशील त्या प्रत्येक वेळी तो तुझ्यासमोर प्रकट होईल, असे वचन देतो. कृष्ण अवतारात रुक्मिणी च्या पोटी तो प्रद्युम्न नावाने जन्म घेईल. त्यावेळी तु त्याची पत्नी होशील.”
शिववचनांची प्रचीती घेण्यासाठी तिने मदनाचे स्मरण केले, तर काय आश्चर्य ! तो तिच्या संमुख पूर्वरूपाने प्रकट झाला. त्याला पाहून रतिला समाधान वाटले. त्या दोघांनी शंकराला वंदन केले. तेव्हा शंकराने त्याला गणपतीच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला व त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले. मदनाने रतिसह गोदावरीच्या तीरी वास्तव्य करून शंभर वर्षं ओमकाराचा जप केला. त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला दर्शन दिले. ‘तुला सुंदर शरीर प्राप्त होईल’ असा आशिर्वाद दिला. मदनाने आपल्या तपाच्या ठिकाणी दिव्य रत्नमय गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती *महोत्कट* नावाने प्रसिद्ध झाला. रामावतार याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नासिका छेदली, म्हणून हे क्षेत्र नाशिक या नावाने ओळखले जाऊ लागले.
कृष्ण अवतारात रुख्मिणीच्या पुत्ररूपाने मदनाने जन्म घेतला. गणपतीच्या आशीर्वादाने त्याला अतिशय सुंदर देह प्राप्त झाला होता. तो लहान असताना शंबर नावाच्या दैत्यानी त्याला पळवून नेले व त्याला महासागरात टाकले. त्यावेळी एका माश्याने त्याला गिळले. कोळ्याने त्या माश्याला पकडले आणि शंबरासुराच्या घरी पाठवले. त्यावेळी रती हि मायावती या नावाने शंबरासुराची दासी म्हणून काम करत होती. तिने तो मासा चिरला. त्याच्या उदरात एक तेजस्वी बालक पाहून तिला मोठं नवल वाटले. तिने त्याचा गुप्तपणे सांभाळ केला.
कालांतराने नारदाने तिची भेट घेतली. तिला प्रद्युम्नाचे जन्मरहस्य सांगितले. तो आपला पती मदन आहे हे कळताच तिचा आनंद गगनात मावेना. मोठा झाल्यावर प्रद्युम्नाने शंबरासुराला ठार केले. मग तो मायावती अर्थात रती सह द्वारकेस गेला. तो हुबेहूब कृष्णासारखाच दिसत होता. त्याप्रसंगी नारदाने तेथे जाऊन प्रद्युम्नाचा परिचय करून दिला. तो आपला हरवलेला पुत्र आहे हे कळताच रुक्मिणीला धन्य धन्य वाटले.
*शेषा ची कथा*
ब्रह्मदेवाने व्यासांना आणखी एक कथा सांगितली.
एके दिवशी शंकर कैलासावर रम्य उपवनात विश्रांती घेत होते. समवेत पार्वती ही होती. तेवढ्यात काही देव, गंधर्व, अप्सरा व किन्नर त्यांच्या दर्शनास आले. त्या सर्वांनी त्यांची पूजा केली. त्यांचे भावपूर्ण स्तवन केले. ते पाहून शेषाच्या मनात मत्सर उत्पन्न झाला. तो स्वतःशीच म्हणाला, “सर्वजण शिवालाच मान देतात. मी सर्वश्रेष्ठ आहे. मी पृथ्वीला मस्तकी धारण करून तिला स्थैर्य दिले. मी शीव मस्तकावर विराजमान आहे, पण तरीही माझ्याकडे कोणी पाहत नाही. याला काय म्हणावे?” सर्वज्ञ शंकरांना शेषाचे मनोगत तात्काळ समजले. त्यांनी आपल्या मस्तकाला जोराने हिसडा दिला. त्यामुळे शेष खाली पडला. तो गडगडत, ठेचकळत कैलासावरून थेट भूलोकी येऊन आदळला. जखमांनी त्याचे सर्व अंग रक्तबंबाळ झाले होते. हे सर्व का घडले याची त्याला क्षणार्धात कल्पना आली. त्याचा गर्व उतरला.
तेवढ्यात नारदांचे आगमन झाले. तेव्हा नारद म्हणाले, “ शिवाने तुझा त्याग केल्यामुळे तुला मनस्वी दुःख होत आहे, हे मी जाणतो. तू गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा सातत्याने जप कर. त्यायोगे गणपतीची कृपा होऊन तू पूर्वीप्रमाणेच सामर्थ्यवान होशील. तुला पूर्वीचे मानाचे स्थान प्राप्त होईल.” नारदांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून, शेषाने गणपतीच्या षडक्षरी मंत्राचा एक हजार वर्षे जप केला. त्याच्या तपश्चर्येने गणपती प्रसन्न झाले. त्यांनी शेषाला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले.
शेष म्हणाला, “हे गणाधीशा, तु सर्वसाक्षी आहेस. सर्वेश्वर आहेस. सर्वज्ञ आहेस. मी बलहीन झालो आहे. पृथ्वीचा भार हि निट पेलू शकत नाही. तू मला पूर्वीप्रमाणे सामर्थ्यवान कर. तुझ्या ठायी असलेली माझी भक्ती सतत वृद्धिंगत होवो, माझ्यावर शिवाची कृपादृष्टी राहो.” गणपतीने ‘तथास्तु’ म्हणून आशीर्वाद दिला. आपल्या विराट स्वरूपाचे त्याला दर्शन घडवले. त्या दर्शनाने शेष धन्य धन्य झाला. त्याने आपल्या तपश्चर्येच्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तो गणपती *धरणीधर* म्हणून प्रसिद्ध झाला. गणेश कृपेने शेष हरीहरांना प्रिय झाला. गणपतीने ही त्याला आपल्या पोटाभोवती वेढुन सन्मानित केले.
*कश्यपांना श्रुष्टी निर्मितीचे वरदान*
प्रलयकाळानंतर गणपतीच्या आदेशानुसार ब्रह्मदेवांनी सृष्टीनिर्मितीस प्रारंभ केला. ब्रह्मदेवांनी संकल्पनाने सर्वप्रथम सप्तऋषींना उत्पन्न केले. त्यांची नावे अशी कश्यप, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ, भारद्वाज,अत्री आणि विश्वामित्र. हे सर्व ऋषी ब्रम्हदेवांचे मानसपुत्र आहेत. ते महाज्ञानी होते. ब्रह्मदेवांनी त्यांना सृष्टी निर्मितीत सहाय्य करण्यास सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार कश्यपाने एक हजार वर्ष एकाक्षर मंत्राचा जप केला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतीने त्यास वर मागण्यास सांगितले. कश्यप म्हणाले, “देवा, मला तुझ्यासारखा एक पुत्र व्हावा आणि सृष्टी निर्मितीच्या कार्यात सहाय्यभूत होण्यासाठी आवश्यक असलेले नैपुण्य, सामर्थ्य व संपन्नता प्राप्त व्हावी. गणपतीने त्यांना तसे वरदान दिले.
कशाला दिती, आदिती, दनु, कद्रू, विनता अशा 14 स्त्रिया होत्या. दिती पासून दैत्य निर्माण झाले. आदितीपासून आदित्य, देव, गंधर्व यांचा जन्म झाला. दनु ला जे पुत्र झाले तेच दानव होत. अन्य स्त्रियांपासून यक्ष, किन्नर, राक्षस, सिद्ध, चारण,गुह्यक,पृथ्वी, पर्वत, नद्या, समुद्र, वृक्ष,वेळी, पशु-पक्षी, धान्य, रत्ने. माणके, मोती,धातू,कृमी,कीटक,सर्प यांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे अनंत सृष्टी आकारास आली. ती श्रुष्टी पाहून कश्यपांस खूप आनंद झाला.
आपल्याला गणेशकृपा लाभली तशी आपल्या पुत्रांनाही लाभावी असे त्यांना सारखे वाटत असे. म्हणून त्यांनी आपल्या पुत्रांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार एकाक्षरी,पंचाक्षरी व षडाक्षरी गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृ आज्ञेनुसार ते सर्वजण एकांत स्थानी गेले. त्या सर्वांना गणपतीने वेगवेगळ्या रूपात दर्शन दिले. गणपतीने कश्यप पुत्रांना जे हवे होते ते इष्ट वरदाने दिली. कश्यापांच्या पुत्रांनी आपापल्या तपश्चर्येच्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून रत्नखचित मंदिरे बांधली. ते गणपती विविध नावांनी प्रसिद्ध झाले. ती नामे एकत्र करून ब्रह्मदेवांनी *गणेश सहस्त्रनामावली* ची रचना केली.
हा सर्व कथाभाग सांगून भृगु ऋषी सोमकांताला म्हणाले, “राजा, ब्रह्मदेवाने व्यासांना जे गणेश पुराण सांगितले, त्याचा हा पहिला भाग मी तुला कथन केला. या भागाला *उपासना खंड* म्हणतात. गणेश पुराणचा जो उर्वरित भाग आहे, त्याला *क्रीडा खंड* म्हणतात.
सोमकांत म्हणाला, “ऋषिवर्य, तुमच्याकडून गणेश पुराण ऐकायला मिळणे ही माझ्यासाठी थोर पर्वणी आहे. गणपतीचे महात्म्य कितीही श्रवण केले तरी मनाचे समाधान होत नाही. आपण मला क्रीडा खंड सहित संपूर्ण पुराण सांगण्याची कृपा करावी. भृगुंना परम संतोष वाटला. राजाच्या जिज्ञासेचे आणि भक्तीचे त्यांना कौतुक वाटले.
*|| उपासनाखंड समाप्त ||*
*|| गणपती बाप्पा मोरया || मंगलमुर्ती मोरया ||*
*श्रीगणेश*
भाग - १६
निर्गुण, निराकार गणेशब्रम्ह... भक्तकल्याणासाठी अनेक सगुण रुप घेऊन वेगवेगळ्या पुराणांत गणेशाने अवतार घेऊन अवतीर्ण झाले. प्रत्येक युगात अवतार धारण करुन धर्मरक्षण केले. सध्याची प्रचलीत, मूषकवाहन, रक्तवर्ण, चतुर्भुज गजानन धारक गणेशमूर्ती आहे. उजव्या व डाव्या सोंडेचे गणपती असा भेद आहे. उजव्या सोंडेच्या सिध्दीविनायक गजानन मुर्तीची पुजा, उपासना करतांना नियमांचं अत्यंत काटेकोर पालन करावं लागते. गणपतीमधे इतर देवांपेक्षा वेगळेपण असल्यामुळे त्यांचा जप करतांना चित्त लवकर एकाग्र होते,
एकदा पार्वतीने अमृताचे मोदक केले. हा महाबुध्दी मोदक असुन जो खाईल तौ सर्व शास्रात व शस्रविद्येत निपुन होईल. हे ऐकुन स्कंद व गणेशाने मोदकाचा हट्ट धरला, त्यावर पार्वतीने युक्तीने दोघांना म्हणाली, पृथ्वीप्रदक्षिणा करुन जो आधी येईल त्याला हा मोदक मिळेल. स्कंद लगेच पृथ्वीप्रदक्षिणेला निघून गेला. परंतु गणपतीने तिथेच शंकर-पार्वतीची यथासांग पुजा करुन त्या दोघांनाच एक पुर्ण प्रदक्षिणा घालुन त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन म्हणाला, आई वडीलांना प्रदक्षिणा म्हणजेच पृथ्वीप्रदक्षिणा! गणपतीच्या बुध्दीचे कौतुक वाटुन पार्वतीने तो दिव्य मोदक गणपतीस दिला.
ब्रम्हदेवाच्या जांभळीतुन एक शेंदरी रंगाचे सुंदर बालक उत्पन्न झाले, त्याचं नांव सिंदुर ! त्याला वरदान देत ब्रम्हदेव म्हणाले, तु ज्याला अलिंगण देशील तो तात्काळ मरण पावेल. त्याने सत्यता पडताळण्यासाठी ब्रम्हदेवालाच अलिंगण देण्यासाठी पुढे सरसावला. संतापुन ब्रम्हदेवाने त्याला शाप दिला की, तु महाभयंकर राक्षस होशील व गणपतीच्या हातुन तुला मरण येईल. सिंदुरचा राक्षसी अत्याचाराने देव भयभीत झाले, शेवटी विष्णूने गणपतीचा धावा केला. गणपतीने सुक्ष्म रुप धारण करुन सर्वशक्तीनीशी परशू सिंदुराच्या छातीवर मारला, त्याबरोबर तो मुर्च्छित झाला. गणपतीने बालरुप घेऊन सिंदुराशी युध्द केले. सिंदुराने बालगणपतीला अलिंगण देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विराट रुप घेऊन गणपतीने सिंदुराचा अक्षरशः चेंदामेंदा केला. त्याच्या रक्ताने गणपतीचे सर्वांग शेंदरासारखे लालीलाल झाले. तेव्हापासुन गणपतीची मुर्ती शेंदरी रंगाची झाली.
गणपतीला दुर्वा प्रिय का? यासंबधी तीन कथा प्रसिध्द आहेत. एकदा यम अप्सरेचं नृत्य पाहत असतांना यमाचं वीर्यपतन झाल, त्यापासुन अनलासूर नावाचा महाभयंकर असूर उत्पन्न झाला. त्याच्या कानठळ्या बसविणार्या आवाजाने पृथ्वीचाही थरकाप व्हायचा. त्याच्या लालबुंद डोळ्यांतुन अग्निज्वाला निघत असे. महाबलाढ्य राक्षसाच्या अत्याचाराने सारा देवलोक भयभीत झाला. अखेर सर्व देव गणपतीला शरण आले. गणपतीने अनलासूराशी युध्द करुन त्याला गिळुन टाकले, त्यामुळे गणपतीच्या सर्वांगाची भयंकर आग होऊ लागली. गणपतीच्या सर्वांगाला चंदनलेप लावला, डोक्यावर चंद्राची स्थापना केली, ज्यामुळे ते भालचंद्र म्हणुन प्रसिध्द झाले. ब्रम्हदेवाने कमळ दिलं म्हणुन पक्षपाणी! पण आग कांही थांबेना. इतक्यात काही त्रृषी मुनि आलेत, त्यांनी २१-२१ दुर्वांच्या जुड्या त्यांच्या मस्तकावर ठेवल्याबरोबर त्यांच्या अंगाची आग शांत झाली. म्हणुन तेव्हापासुन गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा पडली.
दुसरी कथा अशी की, 'दुर्वा' नांवाची एक गणेश भक्त होती. तीने गणपतीला मोहपाशात आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. गणेशालाही ती आवडु लागली. पार्वतीला कळल्यावर "तु तृण होशील असा शाप दिला. दुर्वा पश्चातापदग्ध होऊन उःशाप मागीतल्यावर पार्वती म्हणाली तू तृण जरी झाली तरी गणपतीला प्रिय राहशील.
तिसरी गोष्ट अशी आहे, एकदा कौण्डिण्य त्रृषींनी आपल्या पत्निला एका दुर्वाच्या भारोभर सोने मागायला इंद्राकडे पाठवले. इंद्राच्या आज्ञेने कुबेराने एका पारड्यात दुर्वाची जुडी व दुसर्या पारड्यात सोने ठेवलं, पण पारडं जडच राहिलं. शेवटी कुबेर, इंद्र, ऐरावत, विष्णु, शंकर पारड्यात बसलेत पण कांहीच फायदा झाला नाही. शेवटी कौण्डण्य त्रृषींनीच उपाय सांगीतला की, गजाननाला अर्पण केलेली जुडी ठेवल्यास कार्यसिध्दी होईल. केवढे हे महात्म्य या दुर्वा जुडीचे!
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*श्रीगणेश*
अंतीम भाग - १७.
नरांतक व देवान्तक हे रौद्रकेतुचे दोन महाबलाढ्य पुत्र. त्या दोघांनी तपश्चर्या करुन शंकराला प्रसन्न करुन देव, मानव, इंद्र, दानव, सर्प, पिशाच्च, यक्ष, गंधर्व, शस्र, अस्र, दिवस, रात्र यापासुन भयमुक्त असावं असा वर मागुन घेतला. आणि त्रैलोक्य जिंकण्याच्या मोहिमेवर निघाले. देवान्तकाने इंद्रपुरीवर चढाई करुन इंद्राचा पराभव केला.नंतर ब्रम्हदेवावर चढाई करुन त्यांमाही पळवून लावले. वैकुंठावर चालुन गेल्यामुळे भितीने विष्णु लक्ष्मीसह क्षीरसागरात लपुन बसले. नरांतकानेही 'मृत्युलोक' व 'पाताळलोक" जिंकुन घेतले.
इकडे विनायकानं धुम्रापाक्षाचा वध केला. तसेच कूपक,कंदर, अंधक, तुंग यासारख्या बलाढ्य दैत्यांना खडे चारले. त्यामुळे नरान्तकाने चिडुन दैत्यासह विनायकाला ठार मारण्यासाठी काशीराजाच्या नगरीकडे वळला. विनायकाला युध्दभूमीवर पाहताच नरान्तक त्याच्या अंगावर धावुन गेला, दोघांमधे घमासान द्वंदयुध्द सुरु झाले. नरान्तकाचा कोणताही अवयव तुटला तरी त्याजागी पुनः अवयव फुटु लागला. शेवटी विनायकाने विराटरुप धारण करुन पायाच्पा अंगठ्याने चिरडुन त्याला ठार केले.
नरान्तकाचा वध झाल्याचे कळल्यावर देवान्तक खळवळुन उठला. प्रचंड दैत्य सैन्यासह विनायकावर चालुन गेला, दोघांचे तुंबळ युध्द सुरु झाले. य्राणभयाने देवान्तक विनायकाच्या शुण्ढेखालुन विनायकाच्या बाहेर आलेल्या दाताला धरुन लोंबकळु लागला, तत्क्षणी दात मोडल्याने देवान्तक धाडकण जमीनीवर कोसळला, विनायकाने त्याच तुटलेल्या दाताने त्याच्या मस्तकावर प्रहार करुन त्याचा वध केला. तेव्हापासुन गणपतीला 'एकदंत! म्हणुन ओळखल्या जाऊ लागला,
इंद्रसभेत कौंच नावाचा गंधर्व गात असतां तो एका त्रृषीकडे पाहुन हसला, त्यामुळे अपमानीत त्रृषीने कौंच गंधर्वाला मूषक होशील असा शाप दिला व पराशरत्रृषींच्या आश्रमात पाठवले. त्याच आश्रमात गणेश वेदविद्याचं अध्ययन करीत होते, उंदिर झालेला गंधर्व आश्रमांत बिळं पाडु लागला. आश्रमातील अन्नधान्याची नासधुस,ग्रंथ कुरतडु लागला. पराशयरत्रृषी त्रस्त होऊन गणेशाचे स्मलण केले. गजाननाने तात्काळ उंदरावर पाशांकुश टाकुन पकडल्यावर तो शरण येऊन क्षमा याचना करुं लागला. गजाननाने त्याला अभय दिले व त्याचे वाहन करुन त्याच्या पाठीवर आरुढ झाले.
दुसरी गोष्ट अशी सांगतात की, विनायकाचे वाहन उंदिर पाहुन देवांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यावर गजानन म्हणाले, उंदिर हा अत्यंत भीत्रा आहे, पण तो मानवाचं कल्याणही करतो. प्लेग होतो तेव्हा प्लेगचे किटाणूं तो स्वतःच्या अंगावर घेऊन मानवजातीला सावध करतो. जो दुसर्याचे रक्षण कलतो तो मला अत्यंत प्रिय असतो.
एकदा गजानन उंदरावर स्वार होऊन जात असतांना ते खाली पडलेत. गणपतीचे विशाल पोट, सोंड व एवढासा उंदिर वाहन पाहुन चंद्राला हसायला आले. गणपतीला चंद्राचे हसने अपमानकारक वाटल्याने गणपतीने कृध्द होऊन चंद्राला शाप दिला की, तू निष्पभ, निस्तेज होशील. व जो कोणी तुझं मुख पाहिल त्याच्यावर अरिष्ट कोसळेल. चंद्राने भयभीत होऊन ब्रम्हदेवाकडे गार्हाणे मांडले. त्यावर उपाय म्हणुन त्याला चतुर्थीला गणपतीची पुजा करुन कृष्ण पक्षातील चतुर्थीला नक्त व्रत करायला सांगीतले.
चंद्राने हे व्रत अनेक दिवस निष्ठेने करुन गणपतीला प्रसन्न करुन उःशाप मागीतला. गणपतीने प्रसन्न होऊन चंद्राला पुर्वीचं रुप बहाल केले, परंतु भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याच्यावर वर्षभरात चोरीचा खोटा आळ येईल. चंद्राला दिलेला शाप फक्त एक दिवसापुरतं मर्यादित झालं. गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन त्याज्य असल व कोणाला अवधानाने चंद्रदर्शन घडलेच तर हा श्र्लोक म्हटल्यास पातक नाहीसं होते.
सिंह प्रसेन मधीत् सिंहोजाम्बवता हतः। सुकुमार मा रोदीस्तव ह्यैष स्थमनतकः।।
विश्वरुपी विश्वात्मा गणपतीच आहे. वाणी, चिच्छाक्ति किंवा जीवनशक्ती व आनंद हे याचे रुप आहे. कार्यशक्ती! जीवनशक्ती आणि आनंदशक्ती हे त्यांचे स्वरुप आहे. सच्चिदानंद गणपतीचे स्वरुप आहे! सत् म्हणजेच अस्तित्व, चित् म्हणजे जीवन! जाणीव किंवा ज्ञान आणि आनंद म्हणजे अभौतिक सुखाचा अनुभव गणपतीचे स्वरुप आहे. गणपतीचा साक्षात्कार, अस्तितव-जीवन-ज्ञान या रुपांत होतो,
गणपती हा काळाला जिंकणारा श्रेष्ठ देव असल्यामुळे त्याची योग्य उपासना करुन आपल्या आयुष्याचा सद्पयोग करावा.
समाप्त!
संकलन-मिनाक्षी देशमुख
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय १६ वा*
कानिफनाथ आणि त्यांचे शिष्य यांपैकी एकही भुलला नाही. एक महिना झाला तरी कोणीच वश होईना. मच्छिंद्राला वाटले, धन्य आहे या नाथपंथीयांची. मी मात्र मारूतीच्यासाठी येथे रमलो. त्याचा निरोप घेण्यासाठी कानिफनाथ आला, तेव्हा मच्छिंद्र काय बोलणार? त्याने मोठ्या सन्मानाने त्याला निरोप दिला. खूप संपत्ती, हत्ती, घोडे, कनाती, तंबू, राहुट्या, शिबिका, रत्ने, मोती कितीतरी उपयोगी वस्तू दिल्या. एक कोसभर अंतरापर्यंत मच्छिंद्र त्याच्याबरोबर गेला. मग कानिफाने स्त्रीराज्य सोडले. देशोदेशी हिंडत तो गौडबंगालात सुद्धा गेला. जेथे जेथे तो व त्याचे शिष्य जात तेथे त्यांचे उत्तम स्वागत होई. सगळीकडे कानिफाची व त्याच्या शिष्यांची कीर्ती दुमदुमली. हेलापट्टण नगरात गोपीचंदाला सुद्धा कळले. त्याने दूत पाठविले. कानिफनाथाचे वैभव, त्याच्या सिद्धी, त्याचा प्रभाव, त्याचे वैराग्य त्याचे तपस्वी शिष्य-सर्वत्र झालेली कीर्ती राजाने ऐकली.
इकडे काय झाले? गोरक्षनाथही वंग देशातच आलेला होता. मार्गात एका अरण्यात त्याला कानिफ व त्याचा शिष्यमेळा दोघे भेटले. एकमेकांना भेटून त्यांना फार आनंद झाला. प्रेमाने गोष्टी चालल्या होत्या. कानिफला आपल्या विद्येची चुणूक दाखविली तर गंमत वाटेल. तेव्हा तो गोरक्षाला म्हणाला, ही आंबराई मधुर फळांनी भरली आहे. फळे खायला आणू का? गोरक्ष म्हणाला, नको उगाच कशाला त्रास? कानिफ म्हणाला, त्यात त्रास कसला? शिष्यांना सांगतो, ते आंबे तोडून आणतील. गोरक्ष म्हणाला. एवढा त्रास त्यांना कशाला? आता शिष्य आहेत, नसले तर स्वतःच आणावे लागतील. तुमची इच्छाच असली तर माझ्यासाठी एवढेच करा. आपल्या विद्येच्या बळाने तुम्ही येथे ती फळे आणून द्या. कोणी उठून जायचे नाही. कानिफाला तेच हवे होते. त्याने भस्मावर विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र जप करून भस्म फेकले. त्यामुळे झाडावरचे पिकलेले आंबे सुटले व तरंगत समोर येऊन हातात पडले. कितीतरी आंबे आले, सर्व शिष्यमंडळी व गोरक्ष आंबे खाऊन तृप्त झाले. सर्वांनी हात ॐ धुतले. नंतर गोरक्षाला वाटले, आपली विद्याही याला दाखवावी. मग गोरक्षाने सुद्धा विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र यांचा प्रयोग करून आणखी दूरच्या आंबराईतली फळे आणली. ती पण खाऊन झाली. पुष्कळ फळे उरली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, ही उरलेली फळे पुन्हा वृक्षांना लावून ठेवावी.
कानिफ गडबडला. तो म्हणाला, असे कधी झाले आहे? गोरक्ष म्हणाला खरा गुरूभक्त असेल तर त्याला काय अशक्य आहे? गुरूपुत्र पवित्र, श्रद्धावंत असेल तर तो दुसरा ब्रह्मदेव सुद्धा उत्पन्न करील. इकडचे जग तिकडे करील. त्याला काय कठीण आहे? त्यावर कानिफ म्हणाला, "अरे हो हो! माहित आहे, तू माहीत आहे, तुझा गुरू माहीत आहे. तुमची योगविद्या, योगाचे नाव, भोगाची हाव, सगळे खीराज्य तुझ्या गुरूने भोगले आहे. अजून भोगतोय. कशाला उगाच वल्गना करतो." ते शब्द ऐकताच गोरक्ष खवळला, दुःखीत झाला. गोरक्ष म्हणाला, "तुझा गुरू पण केवढा प्रतापी आहे, माहीत आहे. दहाबारा वर्षे लिदाच्या कूपात पडलाय. प्रत्यक्ष नरकात, त्याला स्वतःचा उद्धार नाही करता येत तो तुला काय उध्दरणार? जरा चार सिध्दी मिळाल्या की झाले, शिष्यांचा तांडा फिरवितोस. हेलापट्टण नगरात बघ जाऊन. राजा गोपीचंद त्या जालंदराला चांगला वस्ताद भेटलाय. उकिरड्यात पुरून टाकलाय त्याला. माझा गुरू असा नाही. मारूतीसह सगळ्या देवांना शरण आणले आहे त्याने. आता पहाच त्याचा प्रभाव ! जय मच्छिंद्रनाथ! जय अलख निरंजन ! आता ही पडलेली फळे पुन्हा डहाळ्यांवर जाऊन चिकटतील." गोरक्षाने पुन्हा स्पर्शाख म्हणून ते आंबे झाडांना चिकटविले. ते पाहून आणि जालंदराचे वर्तमान ऐकून कानिफ प्रांजळपणे गोरक्षाला शरण आला. गोरक्ष बीराज्याच्या दिशेने निघाला. मच्छिंद्र कोठे आहे, त्याचा पत्ता त्याला लागला होता. कानिफ हेलापट्टण नगराकडे निघाला. जालंदराची वार्ता त्याला कळली होती, त्याचा शोध घेतल्याशिवाय त्याला राहवेना.
कानिफनाथ येत आहे हे कळताच राजा गोपीचंद स्वतः मोठ्या वैभवासहित त्याचे स्वागत करायला आला. "जालंदर घाणेरडा होता. हा योगी कसा वैभवशाली आहे! माझ्यासारख्या राजाला असा श्रेष्ठ गुरूच शोभेल. आईला काय कळते?" असे विचार त्याच्या मनात होते. कानिफ संतापलेला होता. पण गुरुची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय राजावर राग करणे बरे नाही, असे त्याने ठरविले. राजा समोर आला. त्याने लोटांगण घातले. त्याची स्तुती केली. त्याला राजवाड्यात नेले. तरी कानिफ शांत होता. राजाने अनुग्रह मागितला, तेव्हा मात्र कानिफाने रागाने म्हटले, "राजा, ज्याचा खरा अनुग्रह तू घेतला पाहिजेस त्याला तू पुरून ठेवले आहेस घोड्याच्या लिदात, शेणात आणि माझ्यापुढे कशाला रे लोटांगण घालतोस?" राजा ते ऐकताच घाबरला. त्याने संतांची दयाळू वृत्ती वर्णन केली. वारंवार क्षमा मागितली. तेव्हा कानिफाने त्याला अभय दिले.
इकडे त्यांचे भाषण ज्या दासींनी ऐकले, त्यांनी मैनावतीला सगळे सांगितले. मैनावती दुःखाने व्याकुळ होऊन राजाला भेटली व त्याला फार बोलली. राजाने तिची पण क्षमा मागितली. कानीफाचा राग शांत करण्याचे काम राजाने आईलाच करायला सांगितले. पुत्रासाठी आई काय करणार नाही? मैनावतीने कानिफाची भेट घेतली. आपण जालंदराची शिष्या आहोत असे सांगितले. कानिफ म्हणाला, "एवढा मोठेपणा सांगतेस तर त्यांना लिदात पुरून का ठेवले? हीच का तुझी गुरूभक्ती? खासा न्याय आहे!" ती म्हणाली, "गुरूबंधु, मी तुझी बहीण आहे. मी काय सांगते ते ऐक. मला ही गोष्ट मुळीच माहीत नव्हती. गोपीचंदाला मी त्यांच्याकडून अनुग्रह घेण्यासाठी विनवीत होते; तेव्हा त्यानेच हे गुप्तपणे केले. मला आता दासीकडून तुमचे बोलणे कळले, म्हणून मी धावत आले. जालंदरनाथ गोपीचंदावर कोप करतील, तर मी बुडालेच म्हणून समजेन, गुरूबंधु ! सर्वांना तूच वाचव." मैनावतीचे बोलणे ऐकून कानिफाचे मन द्रवले. त्याने तिला सांगितले "भिऊ नकोस, मी राजाचे अकल्याण करणार नाही." तेव्हा मैनावती वेगळ्या वाटेने राजवाड्यात गेली. मैनावतीने गोपीचंदाला जेव्हा सर्व सांगितले तेव्हा, त्याची भीती कमी झाली. जालंदरनाथ जिवंत आहे की नाही याची गोपीचंदाला माहिती नव्हती. पण मैनावती मात्र योगीजनांचे तपोबल जाणून होती.
*अल्लक निरंजन...आदेश.*
*🏵मंत्रपुष्प झाल्यावर म्हणण्यात येणाऱ्या प्रमुख गायत्री कोणत्या?*
*आरती झाल्यावर "यज्ञेन यज्ञमयजन्त" हा मंत्र "ॐ स्वस्ति साम्राज्यं" इत्यादि मंत्रपुष्पांजली झाल्यावर त्या त्या देवांच्या गायत्री म्हणण्याचा प्रघात आहे... त्यामध्ये प्रामुख्याने गणपती, सूर्य, देवी, शिव, विष्णु या पंचायतन देवता, ब्रह्माविष्णुमहेश तसेच महाकालीमहालक्ष्मीसरस्वती हे देवतात्रय, सद्गुरू दत्तात्रेय, नवग्रह, मत्स्यकूर्मादि दशावतार, हनुमान, नवनाथ इत्यादि देवता यांचा समावेश होतो. गायत्रीसंग्रहात कित्येक शत गायत्री सांगितलेल्या आहेत. त्यात नेहमी उपयोगी पडणाऱ्या काही निवडक गायत्री खाली दिलेल्या आहेत.....*
*१. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ।।*
*२. भास्कराय विद्यहे मद्ध्युतीकराय धीमहि । तन्नो आदित्यः प्रचोदयात् ।।*
*३. दैव्यै ब्रह्मण्यै विद्यहे महाशक्त्यै च धीमहि । तन्नो देवी प्रचोदयात् ।।*
*४. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि । तन्नो रुद्रः प्रचोदयात् ।।*
*५. नारायणाय विद्यहे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णुः प्रचोदयात् ।।*
*६. वेदान्तनाथाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णुः प्रचोदत्*
*७. कात्यायन्यै विद्यते कन्याकुमार्यै धीमहि । तन्नो दुर्गा प्रचोदयात् ।।*
*८. महालक्ष्म्यै विद्यहे विष्णुपत्न्यै च धीमहि । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ।।*
*९. प्र णो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती । धौनामवित्र्यवतु ॥*
*१०. आंजनेयाय विद्यहे वायुपुत्राय धीमहि। तन्नो वीरः प्रचोदयात् ।।*
*११. नृसिंहाय विद्यहे वज्रदन्ताय धीमहि । तन्नो नृसिंहः प्रचोदयात् ।।*
*१२. कश्यपात्मजाय विद्यहे लघुरूपाय धीमहि । तन्नो वामनः प्रचोदयात् ।।*
*१३. जामदग्न्याय विद्यहे रेणुकात्मजाय धीमहि । तन्नः परशुरामः प्रचोदयात् ।।*
*१४. दशरथात्मजाय विद्यहे सीतावराय धीमहि । तन्नो रामचंद्रः प्रचोदयात् ।।*
*१५. दशरथात्मजाय विद्यहे उर्मिलेशाय धीमहि । तन्नो लक्ष्मणः प्रचोदयात् ।।*
*१६. जनकात्मजायै विद्यहे भूमिपुत्र्यै च धीमहि। तन्नो जानकी प्रचोदयात् ।।*
*१७. देवकीनन्दनाय विद्यहे वासुदेवाय धीमहि । तन्नः कृष्णः प्रचोदयात् ।।*
*१८. भीमकात्मजायै विद्यहे कृष्णकान्तायै धीमहि । तन्नो रुक्मिणी प्रचोदयात् ।।*
*१९. महाज्वालाय विद्यहे अग्निमन्नाय धीमहि । तन्नो वह्निः प्रचोदयात् ।।*
*२०. तत्पुरुषाय विद्महे स्वर्णपक्षाय धीमहि । तन्नो गरुडः प्रचोदयात् ।।*
*२१. दत्तात्रेयाय विद्यहे अवधूताय धीमहि । तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥*
*२२. परब्रह्मणे विद्यहे गुरुदेवाय धीमहि । तन्नो गुरुः प्रचोदयात् ।।*
*२३. हंसहंसाय विद्यहे परमहंसाय धीमहि । तन्नो हंसः प्रचोदयात् ॥*
*२४. भागीरथ्यै च विद्यहे विष्णुपद्यै च धीमहि। तन्नो गङ्गा प्रचोदयात् ।।*
*२५. भास्कराय विद्यहे दिवाकराय धीमहि। तन्नः सूर्यः प्रचोदयात् ।।*
*२६. क्षीरपुत्राय विद्यहे अमृतत्वाय धीमहि। तन्नश्चद्रः प्रचोदयात् ।।*
*२७. अङ्गारकाय विद्यहे भूमिपुत्राय धीमहि। तन्नो मङ्गलः प्रचोदयात् ।।*
*२८. सौम्यगुणोपेताय विद्महे अप्रतिमरूपाय धीमहि । तन्नो बुधः प्रचोदयात् ।।*
*२९. बृहस्पतये विद्महे देववंद्याय धीमहि । तन्नो गुरुः प्रचोदयात् ।।*
*३०. भार्गवाय च विद्महे दैत्यवंद्याय धीमहि । तन्नः शुक्रः प्रचोदयात् ।।*
*३१. कोणस्थाय च विद्महे सूर्यपुत्राय धीमहि । तन्नः शनैश्वरः प्रचोदयात् ।।*
*३२. सिंहिकात्मजाय विद्यहे महावीर्याय धीमहि । तन्नो राहुः प्रचोदयात् ।।*
*३३. तारकाग्रहमस्तकाय विद्यहे रौद्रात्मकाय धीमहि । तन्नः केतुः प्रचोदयात्*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
*🔸 अष्टविनायक 🔸*
*🔸(८)बल्लाळेश्वर- पाली.🔸*
*पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे... या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे.....*
*मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत... मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.....*
*हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे... पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.....*
*पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे... खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.....*
*भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते... सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.....*
*स्रोत: आंतरजाल, विकिपीडिया...*
*🔸गणपतीचे अध्यात्मिक महत्व.🔸*
*वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |*
*निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||*
*भाद्रपद शुध्द चतुर्थीला महासिध्दी विनायकी असे म्हणतात... त्यादिवशी ‘गणपती बाप्पा मोरया’ हा आवाज सर्वत्र ऐकायला मिळतो. ‘मोरया’ म्हणजे नमस्कार. त्या दृष्टीने पाहता, ‘गणपती बाप्पा मोरया’ चा अर्थ गणपती बाप्पाला नमस्कार असा होतो.....*
*प्रत्येक शुभकार्यात सर्वप्रथम श्रीगणेशाचे पुजन केले जाते... गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा, पण अग्रपूजन हे गणपतीचेच झाले पाहीजे. पौराणिक कथा आहे की, अजाणता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला जो कोणी प्राणी प्रथम दिसेल त्याचे शिर आणण्यास सांगितले. पार्षदाला सर्वप्रथम हत्ती दिसतो व पार्षद हत्तीचे मस्तक घेऊन येतो. गणपतीच्या धडावर ते मस्तक ठेऊन गणपती बाप्पाला जिवंत केले जाते व आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गजानन, गणेश, गणराज अशा विविध नावाने ओळखला जाऊ लागतो.....*
*गणपती बाप्पाला हत्तीचे मस्तक लावण्यात एक वैशिष्टय आहे... हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वांहून अधिक बुध्दीमान प्राणी आहे. गण-पती म्हणजे समुहाचा नेता होय. ह्याप्रमाणे नेता व तत्ववेत्ता ह्यांच्या जीवनात बुध्दीची तेजस्विता व समाजाला योग्य मार्गाने नेण्याची अभिलाषा असणे गरजेचे असते.....*
*गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात... बारीक सुई देखिल जमिनीवरुन उचलण्याएवढी सूक्ष्म दृष्टी हत्तीची असते. मानवानेही स्वत:ची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवले पाहिजे. हत्तीचे लांब नाक (सोंड) दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते. नेता व तत्ववेत्ता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे, याचे ही सोंड सूचक आहे.....*
*गणपतीला दोन सुळे असतात... एक पूर्ण व दुसरा अर्धा असतो. पूर्ण सुळा श्रध्देचा व अर्धा सुळा बुध्दीचा प्रतिक आहे.....*
*गणपती बाप्पाला चार हात असतात... एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक व चौथ्या हाताने गणपती बाप्पा आपणास आशीर्वाद देतात.....*
*.गणपती बाप्पाला लंबोदर असे सुध्दा म्हणतात... सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वत:च्या विशाल उदरात साठवून ठेवल्या पाहिजेत ह्याची सूचना त्याचे मोठे पोट देते.....*
*गणपतीचे पाय लहान असतात त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही... म्हणजेच कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये. जसा ससा व कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतो तसे हळूहळू पुढे जाणाऱ्याचे कार्य सुदृढ व सफल बनत जाते.....*
*गणपतीचे वाहन उंदीर आहे. गणपतीचे वाहन इतके लहान असण्याचे कारण म्हणजे उंदीर हा त्याला घराघरात घेऊन जातो... महापुरुषाची साधने अशी लहान व नम्र असली पाहिजेत. जेणेकरुन ते घराघरात प्रवेश प्राप्त करु शकतील व सर्वांसाठी प्रिय बनू शकतील. गणपतीचे वाहन उंदीर हे मायेचेही प्रतिक आहे. उंदराप्रमाणे मायादेखिल मानवाला फुंकर मारुन चावत असते. फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेऊ शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. गणपतीचे वाहन उंदीर आपल्याला फार सूचक गोष्टी समजावते.....*
*गणपतीला दुर्वा फार आवडतात... लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही, असे गवत त्याने आपले मानले व त्याचे मूल्य वाढविले. नेता आणि तत्त्ववेत्ता ज्यांना काही महत्त्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करुन जीवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरे, दूर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही. रंगविरहीत, सुगंधविरहीत; ज्याची जगाच्या दृष्टिने काही किंमत नाही असे कर्मदेखिल प्रभुचरणावर प्रेमाने वाहिले तरी त्याला आवडते.....*
*गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल अधिक प्रिय आहे... लाल रंग हा क्रांतीचा सूचक आहे. शिवाय गणरायाला आपण तांदूळ वाहतो. तांदुळाला संस्कृतमध्ये ‘अक्षता’ म्हणतात. अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा; जो खंडीत नाही तर अखंड आहे. देवाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचे दर्शन अक्षता वाहण्यात आहे.....*
*गणपतीला ‘वक्रतुंड’ म्हणतात... ऋध्दिसिध्दीपासून मुख फिरवून राहणाऱ्यालाच ऋध्दिसिध्दी मिळतात. वाकडे तिकडे चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड.....*
*आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर आपल्या इंद्रियाचा एक गण आहे... आणि या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिध्दीस न्यायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की, मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे; ज्याच्यामुळे काही विघ्ने येऊ नये व कार्य सरळपणे पार पडावे.....*
*गणेश-चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचे विसर्जन आपण अनंत चतुर्दशी-दिवशी करतो... जे सान्त आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात व सगुणाला निर्गुणात विलीन करतो.....*
*अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकरें ॥*
*‘अ’ कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, ‘उ’कार म्हणजे विशाल पोट आणि ‘म’कार म्हणजे त्याचे मस्तक... अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती व मंगलमूर्ती गणेश, नेता व तत्त्ववेत्ता ह्यांचे आदर्श स्वरुप आहे.....*
*अर्चना जोगळे...*
*स्रोत: आंतरजाल, Marathi world.com*
*🔸गणपती बाप्पा🔸*
*पाहूणा तरी कसा म्हणू रे तुला गणेशा? तू तर आम्हा लोकांच्या मना- मनांत कायम घर करून आहेस. तूच तर करता करविता, आरंभ देवता, विघ्नहर्ता.*
*नव्याने कोणत्याही गोष्टीची सुरुवात करावयाची म्हटले की सर्वात पहिल्यांदा तुझीच मूर्ती डोळ्यापुढे ठेवून श्रीगणेशा होतो, आम्हाकडून. आनंदाच्या वेळीसुद्धा तुझ्याच पुढे साखर ठेवावी वाटते सर्वप्रथम. आणि संकटाच्या वेळीही तुझीच तर आठवण होते. तुझ्याच नावाचा घोष असतो मनात. तूच तर देतोस बळ अडचणींवर मात करण्यासाठी. म्हणूनच ना रे तूच सुखकर्ता आणि दुःखहर्ताही.*
*गजानना, गेली दहा दिवस तू येऊन उपकृत केलयंस पाहुणा या नात्याने घराघरात. ते सुद्धा किती खोलवर रुजलाएस तू आमच्या मनात? हे तपासून बघण्यासाठीच ना? अगदी जवळून आमच्या सुखदुःखाशी, आनंदाशी एकरूप होण्या साठीच ना? घडेल तशी सेवा, घडेल तसा नेवेद्य स्वीकारण्यासाठीच ना?*
*हे ओंकारा, एकाच वेळी घराघरांत प्रवेशता झालास, तेंव्हापासून नुसता उत्साह ओसंडून वाहत आहे आमचा. उत्सवी वातावरण निर्मिती करत, आम्हा सर्वांच्या आनंदाला उधाण आणले आहेस तू अगदी!*
*मयूरेश्वरा, तुझ्या साक्षीने कितीतरी शुभारंभाच्या गोष्टी घडल्या. केवढी तरी खरेदी झाली. केवढ्या तरी व्यवहाराचा भागिदार बनलाएस आमचा तू! आणि कितीतरी जणांचं साकडं ऐकून घेतलंस तूच.*
*फार त्रास दिला का रे अमेया, आम्ही तुला? तुझ्या निमित्ताने म्हणून लहान थोरांसाठी कितीतरी उपक्रम राबवले आम्ही. त्यांचा मनमुराद आनंद लुटला आम्हीच. आमच्यातील कलागुण प्रदर्शित करत विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले तुझ्याच संगतीने. त्यांना वाव मिळवून दिला तुझ्याच समोर. डिजे आणि गाण्यांच्या कर्णकर्कश आवाजाने उबग येऊन परतीचा जाण्याचा दिवस जवळ तर केला नाहीस ना तू विनायका? अशीही शंका डोकावतेय मनात.*
*एकदंता, तू आलास तसा प्रत्येकाच्या आनंद व्यक्त करण्याच्या नाना तह्रां तू सहन केल्यास खऱ्या. तुझे कान सुपाएवढे म्हणून काहीही आणि कितीही ऐकून घेण्याची तुझी ही सवय. पण आम्हाला कधी कळणार रे, की हे नाहीच आहे योग्य ते? दे रे बाबा तूच आता अशा लोकांना सुबुद्धी जाता जाता. पण 'तुझ्यासाठी प्रसाद' या नावाखाली आमच्या जिभेचे चोचले भरपूर पुरवून घेतले आम्ही साऱ्यांनी भालचंद्रा.*
*दरम्यानच्या काळात गौराई आल्या. त्यावेळी छोट्या बालकाप्रमाणे पुरवलेले तुझे लाड, आम्हाला आमचे बालपण आठवते करवून गेले. गौराईंना निरोप देताना, 'मी येईन काही दिवसात'. हा तू दिलेला शब्द पाळण्याची तुझी वेळ अगदी समीप येऊ घातली आहे.*
*बाप्पा आज तुझ्या निरोपाचा दिवस. आम्हाला हुरहूर लावणारा, रिकामा रिकामा वाटवणारा आणि ' पुनःश्च कामाला लागा' हे सुचवणारा.*
*पण खरं सांगू लंबोदरा, तुझे रिकामे मखर आवरून ठेवताना राहून राहून आवंढे येतात रे या घशात. डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा घरातील प्रत्येक जण लपवण्याचा प्रयत्न करतो, पण लपतील तर शपथ! खरच दहा दिवस आमच्या सान्निध्यात येऊन आम्हाला सहवास घडवणारा, आमच्या सुखदुःखात एकरूप होणारा आणि आनंदात सोबत करणारा तो तूच एकमेव चिंतामणी. तूच मोरया नि तूच सिद्धेशा.*
*हे वक्रतुंडा, तुझ्या येण्याने आलेले उत्साहाचे भरते तुझ्या निरोपाने रिते करून जातोएंस तू विघ्नेशा.*
*नावं कोणतीही घेतली तरी एकमेव मंगलमूर्ती आहेस तो तूच. हे कसे विसरू आम्ही गणनायका. आम्ही केवळ एवढेच म्हणू शकतो गजमुखा, की आमचा उद्याचा गजर हाच असणार आहे,*
*गणपती बाप्पा मोरया ।*
*मंगलमूर्ती मोरया।*
*पुढच्या वर्षी लवकर या।*
*बाप्पा लवकर या।*
*🔸परिवर्तिनी एकादशी.🔸*
🟣०३/०९/२०२५- परिवर्तीनी एकादशी...🙏*
*भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते... प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होते. परिवर्तिनी एकादशीला काही शुभ योग जुळून येत आहेत. परिवर्तिनी एकादशीचे व्रताचरण, पूजनविधी, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया.....*
*आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मासाचा सात्विक काळ हा व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांसाठी विशेष करून ओळखला जातो... चातुर्मासाचा प्रारंभ आणि सांगता एकादशीच्या व्रताने केली जाते. चातुर्मासातील पहिल्या श्रावण महिन्यात व्रत-वैकल्यांची अगदी रेलचेल असते.....*
*गोकुळाष्टमीनंतर सर्वांना वेध लागतात गणेश चतुर्थी म्हणजेच ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे... प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते.....*
*आषाढी एकादशीपासून श्रीविष्णू शयन करतात, अशी मान्यता आहे... म्हणूनच याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. हा काळ कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला श्रीविष्णू शयनावस्थेत असताना कूस बदलतात. यामुळे विष्णूंच्या स्थानात बदल होतो, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.....*
*यासाठी या एकादशीचे व्रत महत्त्वाचे मानले गेले आहे... परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्यप्राप्ती होते. या एकादशीला केलेल्या श्रीविष्णू पूजनामुळे मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले जाते.....*
*स्रोत: मराठी न्यूज, आंतरजाल...*
*🔸॥श्रीविष्णुभुजंगप्रयातस्तोत्रम् ॥🔸*
*चिदंशं विभुं निर्मलं निर्विकल्पं*
*निरीहं निराकारमोंकारगम्यम् |*
*गुणातीतमव्यक्तमेकं तुरीयं*
*परं ब्रह्म यं वेद तस्मै नमस्ते ॥ १ ॥*
*विशुद्धं शिवं शान्तमाद्यन्तशून्यं*
*जगज्जीवनं ज्योतिरानन्दरूपम् ।*
*अदिग्देशकालव्यवच्छेदनीयं*
*त्रयी वक्ति यं वेद तस्मै नमस्ते ॥ २ ॥*
*महायागपीठे परिभ्राजमाने*
*धरण्यादितत्त्वात्मके शक्तियुक्ते ।*
*गुणाहस्करे वह्निबिम्बार्धमध्ये*
*समासीनमाेंकर्णिकेऽष्टाक्षराब्जे ॥ ३ ॥*
*समानोदितानेकसूर्येन्दुकोटि-*
*प्रभापूरतुल्यद्युतिं दुर्निरीक्षम् ।*
*न शीतं न चोष्णं सुवर्णावदात-*
*प्रसन्नं सदानन्दसंवित्स्वरूपम् ॥ ४ ॥*
*सुनासापुटं सुन्दरभ्रूललाटं*
*किरीटोचिताकुञ्चितस्निग्धकेशम् ।*
*स्फुरत्पुण्डरीकाभिरामायताक्षं*
*समुत्फुल्लरत्नप्रसूनावतंसम् ॥ ५ ॥*
*लसत्कुण्डलामृष्टगण्डस्थलान्तं*
*जपारागचोराधरं चारुहासम् ।*
*अलिव्याकुलामोदिमन्दारमालं*
*महोरस्फुरत्कौस्तुभोदारहारम् ॥ ६ ॥*
*सुरत्नाङ्गदैरन्वितं बाहुदण्डै-*
*श्चतुर्भिश्चलत्कङ्कणालंकृताग्रैः ।*
*उदारोदरालंकृतं पीतवस्त्रं*
*पदद्वन्द्वनिर्धूतपद्माभिरामम् ॥ ७ ॥*
*स्वभक्तेषु संदर्शिताकारमेवं*
*सदा भावयन्संनिरुद्धेन्द्रियाश्वः ।*
*दुरापं नरो याति संसारपारं*
*परस्मै परेभ्योऽपि तस्मै नमस्ते ॥ ८ ॥*
*श्रिया शातकुम्भद्युतिस्निग्धकान्त्या*
*धरण्या च दूर्वादलश्यामलाङ्ग्या ।*
*कलत्रद्वयेनामुना तोषिताय*
*त्रिलोकीगृहस्थाय विष्णो नमस्ते ॥ ९ ॥*
*शरीरं कलत्रं सुतं बन्धुवर्गं*
*वयस्यं धनं सद्म भृत्यं भुवं च ।*
*समस्तं परित्यज्य हा कष्टमेको*
*गमिष्यामि दुःखेन दूरं किलाहम् ॥ १० ॥*
*जरेयं पिशाचीव हा जीवतो मे*
*वसामत्ति रक्तं च मांसं बलं च ।*
*अहो देव सीदामि दीनानुकम्पि-*
*न्किमद्यापि हन्त त्वयोदासितव्यम् ॥ ११ ॥*
*कफव्याहतोष्णोल्बणश्वासवेग-*
*व्यथाविस्फुरत्सर्वमर्मास्थिबन्धाम् ।*
*विचिन्त्याहमन्त्यामसंख्यामवस्थां*
*बिभेमि प्रभो किं करोमि प्रसीद ॥ १२ ॥*
*लपन्नच्युतानन्त गोविन्द विष्णो*
*मुरारे हरे नाथ नारायणेति ।*
*यथानुस्मरिष्यामि भक्त्या भवन्तं*
*तथा मे दयाशील देव प्रसीद ॥ १३ ॥*
*भुजंगप्रयातं पठेद्यस्तु भक्त्या*
*समाधाय चित्ते भवन्तं मुरारे ।*
*स मोहं विहायाशु युष्मत्प्रसादा-*
*त्समाश्रित्य योगं व्रजत्यच्युतं त्वाम् ॥ १४ ॥*
*इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभग- वत्पूज्यपादशिष्यस्य श्रीमच्छंकरभगवतः कृतौ श्रीविष्णुभुजंगप्रयातस्तोत्रं सम्पूर्णम् ॥*
*स्रोत: आंतरजाल, विकिस्त्रोत...*
*🔸संत निळोबाराय महाराज.🔸*
*श्रीसंत निळोबाराय हे घोडनदीच्या काठी प्रभु रामचंदाने स्थापन केलेल्या रामलिंगाचे निस्सीम उपासक होते... रामलिंगाचीते मनोभावे पूजा अर्चा करीत असे. कुलकर्ण वतनही त्यांच्याकडे होते पण त्यांच्या देवपूजेत कुलकर्ण वतनामूळे व्यत्यय आल्यामुळे त्यांनी वतन सोडून दिले व पुजा अर्चा, पंढरीची वारी, व नामस्मरणात ते तल्लीन होऊ लागले. त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू अशी नियमित वारी सुरु केली. त्यांची पत्नी सौ. मैनाबाई हिने सुदधा पती बरोबर पायी वारी सुरु केली. शिरुरहून निळोबा पायी पिंपरनेर, पारनेर मार्गे पंढरपूर आळंदी, देहू अशी वारी करीत असताना संत तुकाराम महाराजांचे चिंरजीव नारायण महाराज यांच्या व निळोबांचा परिचय झाला. नारायण बुवांकडून तुकाराम महाराजांचे चरित्र ऐकावयास मिळाले. त्यामूळे निळोबा खुप प्रभावित झाले.....*
*पारनेरला असतानाच निळोबांरायांच्या मुलीचे लग्न झाले... लग्नात स्वतः पांडुरंगाने विठू गडयाच्या रुपाने पाणी भरण्यापासून सर्वकाम केले. लग्नानंतर निळोबारायांनी विठू गडयाला हाक मारली. त्यांच्या कामाचा मोबदला त्याला दयावा म्हणून बोलावले देवघरातील काम उरकून येतो असे म्हणून विठू गडी देवघराकडे गेले, तेथे फक्त तुळशी फुले व बुक्का होता. निळोबांनी सर्व जाणले, त्यांचे अंत:करण भरुन आले. मुलीच्या लग्नाचा सर्व भार पांडुरंगानेच उचलला खूप श्रम पडले. त्यामुळे निळोबारायांचे अंतःकरण कळवळले.....*
*पिंपळनेरचे भुलोजी पाटील गाजरे यांनी निळोबारायांना विनंती केली की, तुम्ही आमच्या गावी पिंपळनेरीच येऊन रहावे, शिरुर ऐवजी तुम्ही पारनेरला रहात आहातच मग पारनेर ऐवजी पिंपळनेरलाच आपण रहावे असा खूप आग्रह धरला... त्यामुळे निळोबाराय पिंपळनेरलाच स्थायिक झाले. व पिंपळनेरहून ते आळंदी पंढरीची वारी करु लागले. प्रत्येक वेळी त्यांना तुकाराम महाराज सदेह वैकुठाला गेल्याचेवर्णन ऐकावयास मिळत होते. त्यामुळे तुकाराम आपले गुरुअसावेत असे त्यांना सारखे वाटू लागले. निळोबारायांनी तुकाराम महाराजांचा ध्यासच घेतला त्यांच्या तोंडी, ध्यानी, मनी फक्त तुकाराम महाराज होते.....*
*तुका ध्यानी, तुका मनी । तुका दिसे जनी वनी ।।*
*तुका तुका म्हणोनी । निशिदिनी बोलावे ।।*
*अशी निळोबारायांची तुकाराममय अवस्था झाली सर्वानी खूप समजाऊन सांगितले की, तुकाराम महाराज आता येऊ शकणार नाहीत ते वैकुंठाला गेले आहेत... पण निळोबारांयानी अन्नपानी वर्ज्य केले. व कडकडीत उपवास करुन तपश्चर्येस सुरुवात केली ते अन्न पाण्यावासून ४२ दिवस एकाच अंगावर पडून तुकाराम महाराजांचा अखंड जप करत होते. शेवटी पांडूरंगाला न रहावून त्यांनी निळोबांना दर्शन दिले. पांडुरंगाने म्हणाले, निळोबा ! उठ, मी आलोय काय मागायचे ते माग. निळोबांनी डोळे उघडून पाहिलेतर प्रत्यक्ष पांडुरंगच उभे पण निळोबारायांनी परखडपणे त्यांना सांगितले, देवा मी तुला बोलविले नाही मग तु का आलास? मी तुला ओळखतच नाही. मी तुकाराम महाराजांच्या भेटीस आसुसलो आहे.....*
*तेव्हा तु परत जा, येथे तुजलागी बोलविले ।*
*प्रार्थिल्याबाचोनी आलासी का ? ।।*
*प्रल्हादाकैवारी दैत्याची दंवाया । स्तंभी देवराया प्रकटोनी ।।*
*तैशापरी मज नाही बा संकट । तरी का फुकट श्रम केला ? ।।*
*निळा म्हणे आम्ही नोळखुची देवा ।।*
*तुक्याचा धावा करीतसे ।।*
*असे परखड उदगार ऐकून देवही स्तंभित झाले... निळोबारायांनी प्रखर गुरुनिष्ठा पाहून देवालाही परत जावे लागले व देवांनी तुकाराम महाराजांना सांगितले की, तुम्हाला परत मृत्यूलोकात जाऊन निळेाबाला अनुग्रह दिला पाहिजे. अशा रितीने पुन्हा मृत्यूलोकी येऊन तुकाराम महाराजांनी निळोबारायानां उठविले व मस्तकावर हात ठेवून त्यांना अनुग्रह दिला.....*
*येऊनिया कृपावंते । तुकया स्वामी सदगुनाथे ।।*
*हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी ।।*
*माझी वाढविली मती । गुणवर्यायसा स्फूर्ती ।।*
*निळा म्हणे मी बोलता ।।*
*दिसे परी हे त्याची सत्ता ।।*
*अशा रितीने तुकाराम महाराजांनी अनुग्रह दिल्यानंतर निळोबांनी अनेक अभंग, गवळणी, विरहीणी चांगदेव चरित्र वगैरे काव्यलेखन केले... निळोबांची वारी नियमित चालूच होती पण परात्वे आपण पंढरीस जावू शकणार नाही म्हणून निळोबांनी पांडुरंगाला साकडे घातले व सांगितले. देवा पांडूरंगा मला तुझ्या चरणी विलीनकर नाही तर माझ्या गावी पिंपळनेरी तु ये. निळोबांच्या भक्तीस्तव प्रत्यक्ष पंढरीनाथ पांडुरंग भिमानदीच्या काठी तळेगाव जवळ विठठलवाडीच्या डोहात आलो आहे. तेथून मला घेऊन जा. त्याप्रमाणे निळोबांनी मोकळी पालखी घेऊन भूलोजी पाटील गाजरे व भवतगणांसाह तेथे जाऊन पांडूरंगाला रुक्मिणीसह डोहातून बाहेर काढले व पालखीतून वाजत गाजत पिंपळनेरला आणले.....*
*अशा पिंपळनेरच्या या रुक्मिणी पांडूरंगाच्या मूर्ती स्वयंभू मूर्तीआहेत... भुलोजी पाटलांनी निळेाबारायांना राहाण्यासाठी जागा व उदरनिर्वाहासाठी जमीनही दिली पुढे राहत्या घरात व निळोबांनी पांडूरंग – रुक्मिणीसाठी मंदिर उभारले तेव्हापासून पिंपळनेर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाऊ लागले. संत निळोबा यांची समाधी असल्याने शासनाने तिर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हा परिषद माजी सदस्य निळोबाराय मंडळाचे विश्वस्त भास्करराव रासकर यांनी युती शासनाच्या काळात प्रयत्न करुन तिर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. या विश्वस्त मंडळात जेष्ठ समाजसेवक आण्णाहजारे, ज्ञानदेव पठारे पाटील, रामदास रासकर, निळोबाचे वंशंज विठठलबुवा मकाशिर, गोपालबुवा मकाशिर, भागवतबुवा मकाशिर हे आहेत.....*
*स्रोत: आंतरजाल, santsahitya.in*
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*काशीराजाचे गणेशलोकी गमन*
ब्रह्मदेवांनी व्यासांना गणेश कृपेने क्षिप्रप्रसादनाचे कसे कल्याण झाले ते सांगितले. तेव्हा व्यासांनी प्रश्न केला, “हे विधी, मागील कथेत क्षिप्रप्रसादन राजाला गणेशलोकी मुक्ती मिळाली असा उल्लेख आहे, कृपा करून त्या लोकांविषयी माहिती सांगा.” ब्रह्मदेव म्हणाले, “गणपतीने आपल्या कामदायीनी नामक शक्तीचे अंगीभूत शक्तीच्या योगाने इक्षुसमुद्रात जो लोक निर्माण केला तोच *गणेशलोक* होय. त्याला स्वानंदभुवन व निजलोक अशी अन्य नावे ही आहेत. जे जन्मोजन्मी गणेश भक्ती करतात त्यांना या लोकांची प्राप्ती होते. तेथे वास्तव्य करणाऱ्यांना राग-द्वेष सुख-दुःख जन्म-मृत्यू आदी द्वंदयुक्त संवेदना त्रास देत नाहीत. येथील कल्पवृक्ष ज्यांना जे हवे ते देतो. सिद्धी व बुद्धी त्यांची सेवा करतात.” ब्रह्मदेव पुढे काशी राजाबद्दल व्यासांना सांगू लागले.
महोत्कट काशीराजाकडे आला. तो विनायकाचा अवतार आहे हे आधीच माहीत असल्यामुळे काशीराजा त्याची सर्वतोपरी सेवा करीत असे. अवतारकार्य पूर्ण झाल्यावर महोत्कट गणेशलोकी निघून गेला. त्याच्या विरहाने काशीराजा भ्रमिष्टासारखा वागू लागला. विनायका! विनायका! असे म्हणून दिसेल त्या वस्तूला आलिंगन देऊ लागला. काशीराजाची अवस्था पाहून मुद्गल ऋषिंनी त्यांची भेट घेतली. मृदू शब्दांनी त्याचे सांत्वन केले. त्याला धीर दिला. ते म्हणाले, “हे राजा, गणेशलोक पाच सहस्त्र योजने विस्तीर्ण आहे. तेथील भूमी सुवर्णमय आहे आणि रत्नजडित आहे. तेथील संपूर्ण वैभवाचे मी काय वर्णन करणार? व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही रूपात गणाधीश तेथे विराजमान आहे. त्याच्या परम कृपेशिवाय त्या लोकांत कोणालाही प्रवेश मिळत नाही. पाच हजार वर्षे राज्य उपभोग घेतल्यानंतरच तुला तिथे जाता येईल. म्हणून धीर धर, स्वतःला सावर. उर्वरित आयुष्य गणेशाची आराधना कर. त्यातच तुझे कल्याण आहे.”
मुदगल ऋषींचा उपदेश शिरसावंद्य मानून काशीराजाने पाच हजार वर्षे तपश्चर्या केली. तो प्रदीर्घ कालखंड पूर्ण झाल्यावर माघ चतुर्थीच्या दिवशी, मंगळवारी, काशीराजाने आपली नित्यकर्मे आटोपून गणपतीची षोडशोपचारे पूजा केली. ब्राह्मणांना अपार दानधर्म केला. मग तो आतुरतेने गणेशदूतांची वाट पाहू लागला. अल्पावधीतच एक दिव्य विमान आले. त्यात तेजस्वी गणेशदूत होते. त्यांनी काशीराजाला विमानात बसण्याची विनंती केली. राजाने राज्याची धुरा आपल्या विश्वासातल्या प्रधानावर सोपवली. त्यांना प्रजेची नीट काळजी घेण्यास सांगितले. अशाप्रकारे इहलोकीची सर्व कर्तव्य पूर्ण करून त्या राजाने प्रसन्न मनाने विमानात प्रवेश केला. तो दिव्य झाला. त्याला निरोप देताना सर्व प्रजाजन अतिशय व्यथित झाले होते.
काशीराजाने विमानात बसून आकाशात उड्डाण केले. मार्गामध्ये सर्वप्रथम पिशाच्च लोक लागला. ज्यांच्या इच्छा आणि वासना तीव्र असतात, ज्यांनी आयुष्यभर दुष्कर्म केलेले असतात, ज्यांच्या अंतःकरणात प्रचंड आसक्ती, द्वेष, लोभ, क्रोध, कौर्य असते, ज्यांनी आत्महत्या केलेली असते अशी माणसे मृत्यूनंतर होऊन या लोकी येतात. पुढे आणखी एक लोक लागला. तेथील लोक भयंकर स्वरूपाचे अक्राळविक्राळ देहाचे अत्यंत हिडीस असे होते. हा राक्षस लोक आहे. जे लोक वेदांनी उपदेशिल्याप्रमाणे विहित आचरण करत नाहीत, नित्यकर्मे करत नाहीत; अशा लोकांना अंती हा लोक प्राप्त होतो.
त्या नंतरच्या प्रवासात गंधर्वलोक, सिद्धलोक, चारणलोक, यक्षलोक, गृह्यकलोक, इंद्रलोक अग्नीलोक, यमलोक, कुबेरलोक, वरूनलोक, वायूलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, गोलोक, सत्यलोक, विष्णूलोक, शिवलोक असे अनेक लोक राजाच्या दृष्टीस पडले. गणेशदूतांनी त्या सर्व लोकांची माहिती त्याला सांगितली. इंद्राची अमरावती तसेच विधी, हरी आणि हर यांचे रमणीय लोक पाहून राजाला फारच धन्यता वाटली.
त्यानंतर विमान अत्यंत गडद अंधारात प्रवेशले. त्या पुढे त्याला प्रचंड गुहे सारखे मुख असलेली अत्यंत लखलखीत अशी भ्रामरी शक्ती दिसली. त्यानंतर विमानाने दिव्य आणि मनोहर अशा गणेशलोकात प्रवेश केला. तेथील भूमी स्वर्णमयी आणि रत्नखचित होती. तेथे सोन्यारुप्याची भव्य मंदिरे, प्रसाद व गोपुरे होती. तेथील भव्यता, पावित्र्य, रमणीयता आणि सौंदर्य पाहून काशी राजा अगदी थक्क होऊन गेला. तेथे त्याने इक्षुरस प्राशन केला.
गणेशदूतांनी त्याला आपल्या स्वामींपाशी नेले व म्हणाले, “महाराज, आपल्या आज्ञेनुसार आम्ही या श्रेष्ठ भक्ताला येथे आणले आहे.” त्यावेळी तो महागणपती सहस्त्र पाकळ्या असलेल्या अत्यंत दिव्य आणि तेजपुंज अशा कमळाच्या मध्यभागी, उत्तम मऊ वस्त्रांनी मंडीत अशा पलंगावर विश्रांती घेत होता. आपल्या आराध्य दैवताला संमुख पाहुन राजाचे अंतकरण भरून आले. त्याने दोन्ही हात जोडून त्यास नमस्कार केला. त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. राजाने त्याच्या स्तुतीपर श्लोक म्हटले. त्या स्तवनाने गणाधीश फारच प्रसन्न झाला. तो म्हणाला, “हे राजा, आता तुला जन्म मरण नाही. तू या स्वानंदभुवनातच नित्य वास्तव्य कर. त्या आशीर्वचानाने राजा धन्य धन्य झाला.
एवढा कथाभाग सांगून ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, “हे मूने! तुझ्या जिज्ञासा पूर्तीसाठी मी तुला गणेश लोकांविषयी तसेच काशीराजा विषयी सर्व माहिती सांगितली. आता यापुढे मी सिंधु दैत्याच्या वधाची कहाणी तुला कथित करतो.
श्री गणेश पुराण कथा (ब)*
*सिंधु दैत्याचा जन्म तपश्चर्या आणि पराक्रम*
त्रेतायुगात सिंधू नामक दैत्य फारच उन्मत्त झाला. त्या वेळी त्याच्या नाशासाठी गजाननाने पुन्हा एकदा अवतार घेतला.
त्या समयी मिथिल देशातील गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत होता. तो धर्मशील, पुण्यपरायण आणि पराक्रमी होता. उग्रा ही त्याची पत्नी. ती पतिव्रता स्त्री होती. या दाम्पत्यास पुत्र संतान नव्हते. पुत्र नसल्यामुळे राजाला निराशेने ग्रासले होते. त्याचे राज्यकारभारात लक्ष लागेना. योगायोगाने त्याच वेळी शौनक ऋषींचे राज्यसभेत आगमन झाले. राजाने त्यांची षोडशोपचारे पूजा केली. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने आपली सर्व व्यथा-चिंता त्यांना सांगितली. त्यांनी त्याला धीर दिला. ते म्हणाले, “राजा, निराश कशासाठी होतो? तुझ्या मनाला आलेली मरगळ झटकून टाक. भक्तिभावाने सूर्याची उपासना कर. तुला एक तेजस्वी आणि पराक्रमी पुत्र होईल.
शौनकांनी उपदेशिल्याप्रमाणे राजा रानीने त्या व्रताचरणास संकल्पपूर्वक प्रारंभ केला. ते अनुष्ठान चालू असताना रात्री राणीला स्वप्नदृष्टांत झाला. त्यात सूर्याने तिच्या पतीच्या रूपात येऊन तिच्याशी अंगसंग केला आणि त्यापासून तिला गर्भधारणा झाली असे दिसले. वस्तुस्थिती हि तशीच होती. अन्य दिनी हा दृष्टांत तिने राजाला कथन केला व म्हणाली, “स्वामी अनुष्ठान चालू असताना माझ्याकडून ब्रह्मचर्य पाळले गेले नाही, म्हणून हे व्रताचरण पुढे चालू ठेवावे की नाही?” तिचे बोलणे ऐकून राजाला नवल वाटले. आता आपल्याला पुत्र होणार अशी त्याला खात्री वाटू लागली. मग ते व्रत तसेच राहून गेले आणि पुढील अनर्थ घडला.
स्वप्नदृष्टांतानंतर उग्रा राणी गर्भवती राहिली. तो गर्भ दिसामासाने वाढू लागला. त्याबरोबर त्याचे तेजही वाढू लागले. पुढे पुढे ते राणीला अगदीच असह्य झाले. शेवटी नाईलाजाने तिने तो गर्भ समुद्रात टाकला. तेथे त्या गर्भाची झपाट्याने वाढ झाली. यथावकाश त्या गर्भापासून अत्यंत तेजस्वी बालक उत्पन्न झाला. त्याची अंगकांती रक्तवर्ण होती. हा चक्रपाणी राजाचा पुत्र आहे हे समुद्राला माहित होते. त्या बालकाला घेऊन त्याने गंडकी नगर गाठले. ब्राह्मणाच्या रूपात राजाची भेट घेतली. त्याने त्या बालकाचे जन्म वृत्त सांगितले. तो पुढे म्हणाला, “हे राजा, हा तुझाच पुत्र आहे. याचा स्वीकार कर,”
पुत्रमुख पाहून राजा-राणीला परमानंद झाला. त्यांनी नगरात साखर वाटली. राजाने ब्राम्हणांना बोलवुन त्या पुत्राचे जातकर्म संस्कार केले. बाराव्या दिवशी त्याचे थाटात बारसे केले. समुद्रात जन्म झाला म्हणून त्याचे *सिंधू* असे नामकरण करण्यात आले. मोठा झाल्यावर याच सिंधूने दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून सूर्यमंत्राचा उपदेश घेतला. मग माता पित्याची आज्ञा घेऊन तो तपश्चर्या करण्यासाठी निघाला. त्यामुळे प्रसन्न झालेल्या सूर्यनारायणाने त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले. सिंधू म्हणाला, “हे प्रभो, तू मला अमरत्व प्रदान कर. सूर्य म्हणाला, “वत्सा, जेथे जन्म तेथे मृत्यु निश्चित आहे. हा सृष्टीचा अटळ नियम आहे. त्याऐवजी मी तुला अमृतपान करवितो. जोपर्यंत हे अमृत तुझ्या उदरात असेल तोपर्यंत तुला कोणापासूनही मृत्यू संभवणार नाही.” त्या वरदानाने सिंधू समाधान पावला. सूर्याने त्याला अमृतपान करविले आणि तो अदृश्य झाला.
तपश्चर्येने अपेक्षित हेतू साध्य करून सिंधू आनंदाने गंडकी नगरीत परतला. चक्रपाणी राजा थकला होता. त्याने शुभमुहूर्तावर सिंधूला राज्याभिषेक केला. मग वानप्रस्थाश्रमाला अनुसरून अरण्य गमन केले. सूर्याच्या वरप्रसादाने सिंधूच्या मनात त्रीखंडावर अधिसत्ता प्रस्थापित करण्याची ईर्षा निर्माण झाली. त्याने पृथ्वीवरील सर्व राजांना हरवून पृथ्वीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. मग त्याने पाताळलोक जिंकले. लोक त्याला सिंधु दैत्य म्हणूनच ओळखू लागले. कालांतराने सिंधूने देवांची राजधानी असलेल्या अमरावती वर स्वारी केली. इंद्र सूक्ष्म रूपाने त्याच्या हातून निसटला, तो विष्णूला शरण गेला. इंद्राकडून देवांच्या दुर्दशेचे वृत्त ऐकून विष्णूला राग आला. तो गरुडारूढ होऊन त्वरेने अमरावतीकडे निघाला.
विष्णुने आपले सुदर्शन चक्र दैत्यांच्या दिशेने भिरकावले. त्या चक्राने लक्षावधी दैत्यांना कंठस्नान घातले. सिंधुदैत्य संतापाने मोठ्याने गर्जना करत देवांवर धावून गेला. समोर येणाऱ्या प्रत्येक देवाला पराजित करून तो वेगाने पुढे सरकत राहिला. त्याचा तो विलक्षण पराक्रम पाहून विष्णू प्रसन्न झाले. ते म्हणाले, “सिंधु दैत्या, तुझे युद्ध कौशल्य पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घे.” सिंधू म्हणाला, “हे विष्णू, तुम्ही सर्व देवांसह माझ्या गंडकी नगरीत येऊन राहा.” श्रीहरीने त्याचे म्हणणे तात्काळ मान्य केले आणि युद्ध थांबले.
त्यानंतर सिंधूने सतलोक आणि कैलासावर स्वारी करून ते जिंकून घेतले. मग तो विष्णू सह सर्व देवांना घेऊन गंडकी नगरात आला. वरदानामुळे विष्णूसह सर्व देव सिंधु दैत्याच्या तावडीत सापडले. ते त्याच्या नजरकैदेतच होते जणू! त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी दैत्यराजाची परवानगी घ्यावी लागत होती. त्यांनी एकत्रित विचारविमर्श केला. तेव्हा देवगुरु बृहस्पती म्हणाले, “गणपती हा संकट निवारक म्हणून प्रसिद्ध आहे. आपण त्याला शरण जाऊन त्याची आराधना करू.” तो विचार सर्वांना पटला. मग त्यांनी नगरातील एका गुप्त मंडपात दशभुजा गणपतीची मातीची सिंहारूढ मूर्ती स्थापन केली. तिची षोडशोपचारे पूजा केली. त्यावेळी त्या मूर्तीतून असामान्य तेज प्रकट झाले. त्यामध्ये देवांना आदीविनायकाचे दर्शन झाले. त्याने सर्वांना धीर दिला. गणपतीने अभय दिल्यामुळे सर्व देव चिंतामुक्त झाले. ते सर्वजण योग्य काळाची वाट पहात कालक्रमणा करू लागले.
श्री गणेश पुराण कथा (क)*
*गणेशाचा जन्म , सिंधू दैत्याचा वध*
कैलासावर सिंधूची सत्ता प्रस्थापित झाल्यावर शंकर आपल्या परिवारासह मंदार पर्वतावर राहू लागले. पार्वती नेमाने गणपतीची आराधना करत असे. तो परमात्मा कधी एकदा आपल्या पोटी जन्म घेतो असे तिला झाले होते. एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तिने गणपतीची मातीची मुर्ती तयार केली. मनोभावे पूजन केले. तेव्हा ती मूर्ती एकदम सजीव झाली. ती म्हणाली, “माते, ज्याचे निरंतर ध्यान करतेस तोच मी परमपुरुष गणपती आहे. सिंधूदैत्याच्या वधासाठी तुझा पुत्र म्हणून मी अवतार घेतला आहे.” दुसर्याच क्षणी या मूर्तीने बालरूप धारण केले. ते दृश्य पाहून पार्वतीचे हृदय आनंदाने भरून आले. तीने त्या बाळाला वात्सल्याने आलिंगन दिले. त्याचे मुके घेतले. त्याला स्तन्य दिले.
हे वर्तमान कळताच शिवा सहित सर्व देवांना परमानंद झाला. पुत्रजन्म प्रित्यर्थ भगवान शंकराने मोठा सोहळा करण्याचे ठरवले. त्याने थोर ऋषींना बोलवून त्या बाळाचे जातक आदी संस्कार केले. त्यांनी त्यांची जन्मकुंडली तयार केली व म्हणाले, “भाद्रपद शुद्ध चतुर्थीस, सोमवारी, स्वाती नक्षत्रावर, सिंह लग्न असताना आणि पाच ग्रह शुभ असतांना, जन्मलेला हा बालक महापराक्रमी होईल. हा दैत्यांचा संहार करून लोकांचे कल्याण करील.” ते भविष्यकथन ऐकून शिवाला फारच समाधान वाटले. त्यांनी आपल्या पुत्राचे अकराव्या दिवशी थाटात बारसे केले. त्याचे *गणेश* असे नामकरण करण्यात आले. ‘जो कोणी या नावाचा कार्यारंभी उच्चार करील, त्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल’ असा शंकराने त्याला वर दिला.
त्यानंतर गंडकी नगरात एक आकाशवाणी झाली, ‘हे सिंधू, तुझा वध करणारा गणेशरूपाने पार्वतीचा पुत्र म्हणून जन्मला आहे.’ ती देववाणी ऐकून सिंधूदैत्य अस्वस्थ झाला.त्याला चिंतेने ग्रासले. आपला शत्रू लहान आहे तोपर्यंत त्याचा काटा काढावा असा विचार करून त्याने अनेक वेळा अनेक बलाढ्य दैत्यांना मंदार पर्वतावर पाठवले. अनेक दैत्य गिधाड, साप, अजगर, मेंढी, टोळपक्षी, मासा अशा अनेक प्राण्यांच्या रूपामध्ये मंदार पर्वतावरील गणेशाला मारण्यासाठी गेले. त्याच प्रमाणे क्षेम आणि कुशल, क्रूर, बालासुर, व्योमासुर, शतमहिषा, कमठासूर, मंचकासूर, दुंदुभी, कुटाकासूर, कर्दम, खडगासुर, छायासुर,चंचल यांसारखे अनेक दैत्य त्याने पाठवून गणेशाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु बाल रूपातील गणेशाने सर्व दैत्यांची माया ओळखून सर्व दैत्यांना यमसदनी धाडले. बाल रूपातील गणेशाने आपल्या अनेक लीला दाखवून शंकरांनी पार्वतीला मोठे आश्चर्य चकित केले. त्याच्या बाललीला पाहून शंकर पार्वती मंत्रमुग्ध होत असे.
त्यानंतर गणपती चौदा वर्षांचे झाल्यावर त्यांनी गंडकी नगरात सिंधू दैत्यावर आक्रमण केले. सिंधू दैत्याला युद्धासाठी आमंत्रित केले. दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले. समोर साक्षात मृत्यूच उभा आहे याची जाणीव असूनही सिंधु दैत्य तलवार उगारून गणेशावर धावला. तेव्हा शिवपुत्र सौम्यरूप धारण करून मयुरावरून खाली उतरला. मग त्याने क्षणाचाही विलंब न करता सिंधूच्या नाभीस्थानाचा वेध घेऊन परशु भिरकावला. तो वार चुकविण्याचा सिंधूने खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. परशूच्या वाराने त्याचे पोट चिरले जाऊन त्यातील अमृतसंचय बाहेर ओघळला. नंतर त्याच्या पोटातून भळाभळा रक्त वाहू लागले आणि तो बलाढ्य महादैत्य मोठी किंकाळी मारून खाली कोसळून गतप्राण झाला. सिंधू दैत्याचा वध करून गणेशाने विजय मिळवला तेव्हा सर्व गणांनी उत्स्फूर्तपणे त्याचा जयजयकार केला. देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. सर्वांनी त्यांची स्तुती केली. ही स्तुती सर्वविघ्ननाशक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. सिंधूच्या वधाने देव बंधमुक्त झाले.
सिंधू राजाचा वध केल्यानंतर गणेशाने माता पार्वती आणि पिता महादेवांकडे अवतार कार्य संपवून निजधामी जाण्याची अनुज्ञा मागितली. ते ऐकून दोघेही शोकव्याकुळ झाले. पुत्रवियोगाच्या कल्पनेने माता पार्वती फारच दु:खी झाली. तिचे सांत्वन करताना गणपती म्हणाले, “ माते शोक करू नकोस. कालांतराने सिंदूर या दैत्याचा वध करण्यासाठी मला अवतार घ्यावाच लागणार आहे. तेव्हाही मी तुझ्याच पोटी जन्म घेईल.” ‘जो कोणी संकटकाळी माझे स्मरण करील, त्या संकटात मी त्याचे रक्षण करील’ असे अभिवचन देऊन गणेशाने गुप्त होऊन आपल्या अवताराची समाप्ती केली.
ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, “हे मुनि, असे आहे मयुरेश्वराचे अद्भुत चरित्र. जो कोणी हे चरित्र पूर्ण श्रद्धेने श्रवण,पठण करील त्याला आयुष्य,आरोग्य, यश,कीर्ती आणि धन प्राप्ती होईल. त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील.”
*🔸भाद्रपद (प्रोष्ठपदी) पौर्णिमा.🔸*
*भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्ष चालू आहे... तिची पंधरावी पौर्णिमा तिथी असेल, तिला भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच "प्रोष्ठपदी पौर्णिमा" असे म्हणतात.....*
*भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्या, तलाव, विहीर इत्यादींमध्ये स्नान करून नंतर गरीब, वंचितांना, ब्राह्मणांना दान केल्यास पुण्य प्राप्त होते... याशिवाय भाद्रपद पौर्णिमेला आणखी एक महत्त्व आहे. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या मते, भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा श्राद्ध केले जाते.....*
*या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो. भाद्रपद पौर्णिमा श्राद्ध पितृ पक्षाचा भाग मानला जात नाही. ज्या लोकांचे पूर्वज पौर्णिमेच्या दिवशी मरण पावले, ते सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करतात.....*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸भाद्रपद पौर्णिमा.🔸*
*पौर्णिमा तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भाद्रपद पौर्णिमा म्हणतात... श्राद्ध या महिन्याच्या पौर्णिमेच्या तारखेपासून सुरु होतात. या दिवशी चंद्र 16 कलांनी पूरिपूर्ण असतो. या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केले जाते आणि भगवान सत्यनारायणाची पूजा केली जाते.....*
*भाद्रपद महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते... या दिवशी जे भगवान सत्यनारायणाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात त्यांचे सर्व त्रास दूर होतात. या दिवशी विशेष उपाय केल्यास तुमच्या घरातील सर्व समस्या लवकरच दूर होतील.....*
*शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे शुभ असते... असे मानले जाते की, या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला धूप-दीप आणि फुले अर्पण करावीत. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतील आणि तुमचे सर्व त्रास दूर होतील.....*
*जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल, तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात तांदूळ, साखर मिसळा आणि “ओम स्त्रां स्त्रीं स: चन्द्रमसे नम:” या मंत्राचा जप करताना अर्घ्य द्या. हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल... याशिवाय, जर जोडप्याने एकत्र चंद्राला अर्घ्य दिले तर सर्व समस्या दूर होतील. अर्घ्य अर्पण करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.....*
*भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या मूर्ती आणि चित्रासमोर ११ कौडींवर हळदीची पेस्ट लावा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा... यानंतर कनकाधारा स्तोत्राचे पठण करा. या कौडी लाल कपड्यात बांधून तिजोरी आणि कपाटात ठेवल्याने संपत्ती वाढेल.....*
*देवी लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी इत्र, सुगंधी चंदन अर्पण करा... या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी यंत्र स्थापित करणे शुभ आहे. या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दूध, पांढरी मिठाई, चांदी आणि पांढरे कपडे यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान केल्याने धन प्राप्त होते.....*
*टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे... कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा..…*
*स्रोत:, आंतरजाल, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम...*
*🔸पितृपक्षाविषयी शंका समाधान🔸.*
*१). घरात / कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का ? नाही. मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही.*
*२). घरात / कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?*
*सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात “अविधवा नवमी” (भाद्रपद कृष्ण नवमी) या दिवशी श्राद्ध करता येते.*
*३. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात ?*
*पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात.-*
*४). ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे. ?*
*शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे.*
*५. संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे ?*
*अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात.*
*६). पितरांची तिथी माहित नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?*
*भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या ( सर्वपित्री अमावस्या ) या दिवशी सर्व पितरांचे (ज्ञात-अज्ञात) श्राद्ध घालता येते. तसेच ब्राम्हणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे.*
*७). श्राद्ध घालतांना नैवेद्य मंडल कसे घालावे ?*
*पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे.*
*८). अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी ?*
*पितृस्तुती, बाह्यशांती सुक्त, पितरतुष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी १२ वाजता एका पोळीवर थोडा भात, तूप, ५-७ काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून १ माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते.*
*मंत्र : मध्व: सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम |*
*बहिर्ष्मती रातीर्वीश्रिता गिरीषा यांत नासत्योप वाजै: ||*
*९. मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्याचा अधिकार कोणाला असतो?:*
*नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र) असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील) जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहीत्राचा अधिकार असतो.*
*ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी) आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहीत्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो. हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय. नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही.*
*१०. पितृपक्षात पारायण करता येते का ?*
*हो. पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते.(गुरुचरित्र/नवनाथ/भागवत/श्रीपाद चरित्र इत्यादी) पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते.*
*११. दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते ?*
*सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी पितर तुष्टीकारक स्तोत्र व बाह्यशांती सुक्त वाचावे. रोज पंचमहायज्ञ करावा. दर अमावस्येला हिरण्यदान करावे.*
*🔹पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व: पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईटशक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात.*
*🔹पितृपक्ष (महालय पक्ष)*
*व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते.*
*🔹श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे या लेखातून जाणून घेऊया.*
*पितृपक्षात श्राद्ध का करावे ?*
*पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज- तमात्मक कोषांशी निगडित असणार्या पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते; म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते.*
*पितृपक्ष हे हिंदु धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे.*
*पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात. यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात.*
*पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना, इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते.*
*🔹भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.*.
*हे श्राद्ध पितृत्रयी:*
*पिता, पितामह (आजोबा), प्रपितामह (पणजोबा);*
*मातृत्रयी: माता, पितामही, प्रपितामही; सापत्नमाता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातुल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील, ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात. देवांच्या स्थानी (जागी) धूरिलोचन संज्ञक विश्वेदेव घ्यावे.*
*शक्य असल्यास देवांकरता दोन, चार पार्वणांना (मातृत्रयी, पितृत्रयी, मातामहत्रयी आणि मातामहीत्रयी) प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावेत. एवढे शक्य नसेल, तर देवांकरता एक, चार पार्वणांकरता चार आणि सर्व एकोद्दिष्ट गणाला एक, असे सहा ब्राह्मण सांगावेत.*
*योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे ‘यावद्वृश्चिकदर्शनम्’ म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले, तरी चालते.’*
*पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावयाची श्राद्धे खाली सारणीत दिली आहेत.*
*🔹टीप:- पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते, तेवढे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे. वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते. त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास साहाय्य होते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे.*
*🔹काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर १२ व्या दिवशीच सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणार्या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध केले, तरी चालते. (मूळस्थानी)*
*🔹पक्षपंधरवडा (पितृपक्ष) सर्व कर्मास निषिद्ध का असतो ?*
*पक्षपंधरवडा कालावधी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो; पण भाद्रपद अमावास्येला (म्हणजेच सर्वपित्री अमावास्या) महालयाची समाप्ती होत नाही. महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होते; म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल.*
*🔹विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध नसणे*
*पक्षपंधरवडा (महालय) निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की, या पंधरवड्यात ‘विवाह’ हा शब्दही उच्चारला जात नाही. मग विवाहविषयक बोलणी करणे, स्थळांना भेटी देणे, विवाह निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर रहातात. प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पक्षपंधरवडा आड येत नाही.*
*पक्षपंधरवड्याचा दूरान्वयाने संबंध पिशाचे इत्यादी पापयोनींशी लावला जातो; पण परिस्थिती अगदी उलट असते. निधन झालेल्या व्यक्तीची प्रेतत्वनिवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निधनोत्तर येणार्या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही.*
*🔹भरणी श्राद्ध...*
*पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केल्याने शास्त्राज्ञेचे उल्लंघन होणे*
*पहिल्या वर्षी अब्दपूर्ती वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते, पितृत्व नसते. पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो. असे असतांनाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणी श्राद्ध केले जाते, यात शास्त्राज्ञाचे उल्लंघन होते.*
*🔹भरणी श्राद्ध करण्याचा काल...*
*पहिल्या वर्षानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावे. वास्तविक ‘ते प्रतिवर्षी करावे’, अशी शास्त्राज्ञा आहे; पण दुराग्रहाने ते एकदाच करणार्यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये...*
*🔹इतरही मघादी श्राद्धे...*
*भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसर्या वर्षापासून करावीत.*
*🔹नित्य तर्पण...*
*नित्य तर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये...*
*🔹श्राद्ध विधी स्वत:करणे महत्त्वाचे...*
*श्राद्धविधी स्वतः करायचा असतो. तो स्वतःला करता येत नाही; म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवतो...*
*आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत. यावर उपाय म्हणून श्राद्ध -संकल्पविधीच्या पोथ्या मिळतात. त्या आणून प्रत्येकाने श्राद्ध- संकल्पविधी पाठ करावा. हा पाठ संस्कृत भाषेत असतो. आपण अन्य भाषा शिकतो, मग संस्कृत तर देवभाषा आहे. तसेच ती आपल्याला सहज येण्यासारखीही आहे. (वरील सूत्र तत्त्वतः योग्य असले, तरी संस्कृत भाषेतील उच्चारांतील काठीण्य, शास्त्रात सांगितलेला विधी नीट आकलन होण्याची मर्यादा इत्यादी पहाता स्वतः श्राद्धविधी यथासांग पार पाडणे, हे प्रत्येकाला शक्य होईल, असे नाही. अशांनी ब्राह्मणाकरवी आणि ब्राह्मण न मिळाल्यास एखाद्या जाणकाराकरवी श्राद्धविधी करण्यास आडकाठी नाही. श्राद्धविधी होणे, हे अधिक आवश्यक आहे, हे येथे लक्षात घ्यावे.)*
*🔹श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करणे आवश्यक असणे...*
*पूर्वजांची स्पंदने आणि त्यांच्या सर्वांत जवळच्या वारसदारांची स्पंदने यांमध्ये पुष्कळ साधर्म्य असते. एखादा सूक्ष्म-देह वेदना अनुभवत असतो, तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याचा सर्वांत जवळचा वारसदारही अनुभवत असतो. याच कारणास्तव श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करायचे असतात. मुलाची स्पंदने आणि पितरांची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्धतर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पितरांना ग्रहण करणे सुलभ होते...*
*🔹श्राद्धविधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला 'संधी न देणारा हिंदु धर्म !'*
*मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही) समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही) शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे. एकत्र कुटुंबात कर्त्या वडील पुरुषाने (कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांचे पालन पोषणाचे उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीने) श्राद्धे करावीत. विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.’ प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल आणि त्याला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदुधर्माने सिद्ध केली आहे.*
*🔹पितृपक्षाबद्दल अधिक माहिती*
*सामान्यांना एकाच प्रकारचे श्राद्ध माहिती आहे, पण श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत...*
*१). नित्यश्राद्ध : यासाठी दररोज केवळ जलाचा वापर करतात.*
*२). नैमित्तिक श्राद्ध : सपिंडाच्या अगोदर करतात.*
*३). काम्यश्राद्ध : आपली जी कामना-इच्छा असेल ती तडीस जाण्यासाठी हे श्राद्ध करतात.-*
*४). नांदी श्राद्ध : षोडष संस्कारादरम्यान करावयाचे एकप्रकारचे वृद्धीश्राद्ध. यालाच कर्मांग श्राद्धदेखील म्हणतात.*
*५). वृद्धीश्राद्ध : विवाहाच्या मंगलकार्यप्रसंगी करायचे श्राद्ध*
*६). यात्रा श्राद्ध : यात्रेस प्रस्थान करण्यापूर्वी घृताचा वापर करून करावयाचे श्राद्ध.*
*७.) सपिंडन श्राद्ध : एखादी व्यक्ती मृत झाल्यापासून १२ व्या दिवशी करावयाचे श्राद्ध. यामुळे व्यक्ती आपल्या पितरांमध्ये संयुक्त होते. हे श्राद्ध झाल्याशिवाय इतर कुठलेच मंगलकार्य, शुभकार्य करता येत नाही.*
*८). शुद्धीश्राद्ध : प्रायश्चित्त इत्यादीसाठी, मन, शरीरशुद्धीसाठी हे करतात.*
*९.) अष्टकाश्राद्ध : भाद्रपद कृष्ण अष्टमीला हे श्राद्ध करतात.*
*१०). पुष्टीश्राद्ध : द्रव्य, संपत्ती, ऐश्वर्य, आरोग्य इत्यादींच्या प्राप्तीसाठी पुष्टीश्राद्ध करतात.*
*११). पार्वण श्राद्ध : दरवर्षी करावयाच्या' श्राद्धाला पार्वण श्राद्ध म्हणतात. अमावस्या, चतुर्दशी, अष्टमी व संक्रांती पर्वावर करावयाच्या श्राद्धासही पार्वण श्राद्ध म्हणतात.*
*१२). गोष्टी श्राद्ध : विद्वान व ब्राह्म समुदाय एकत्र येऊन तीर्थाच्या ठिकाणी पितरतृप्त करून संपत्ती व सुख प्राप्तीसाठी करावयाच्या श्राद्धास गोष्टीश्राद्ध म्हणतात. श्राद्धाविषयी चर्चा करताना अचानक स्वयंस्फूर्तीने जे श्राद्ध केले जाते त्यालाही गोष्टी श्राद्ध म्हणतात.*
*याव्यतिरिक्त दधी श्राद्ध, हिरण्य श्राद्ध, हस्तश्राद्ध, चट श्राद्ध, आत्म श्राद्ध असे विविध श्राद्ध प्रकार आहेत...*
*🔹श्राद्धाच्या काही सोप्या पद्धती पण आहेत.*
*१) पाण्याने भरले कुंभ- कलश दान करा.*
*२)अन्नदान करा.*
*३)तीळाचे दान करा.*
*४)गाईस गवत घाला.*
*५)श्राद्ध तिथीस उपोषण- उपवास करा.*
*६)श्राद्ध विधीचे वाचन करा.*
*७)दक्षिणाभिमुख बसून पितरांचे मन:पूर्वक श्रद्धेने स्मरण करा. त्यांच्या आठवणीने डोळे आपोआप ओले होतात. ते होऊ द्या.पितर तुष्टीकारक स्तोत्र वाचा.*
*८) निर्मनुष्य जंगलात आकाशाकडे दोन्ही हात उंच फैलावून अंत:करणापासून मी निर्धन व अन्नविरहित आहे, मला पितृऋणातून मुक्त करा, अशी प्रार्थना करा.*
*जो श्राद्ध करणार असतो, त्याला आपल्या मृत पित्याची मृत्यूची तिथी नीट माहिती असावी. त्याच तिथीला महालय पक्षात (म्हणजेच भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत) श्राद्ध करावे.*
*🔸हे श्राद्ध नेमके कधी करावे?*
*उत्तर: श्राद्ध अपरान्हकाळात करावे. आता प्रश्न पडेल तो हा अपरान्ह काळ काढण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. तो आपल्यालाही काढता येतो. अपरान्ह काळ काढण्यासाठी आपल्या गावच्या सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा माहिती असायला हव्यात. प्रत्येक गावाची ती वेळ वेगळी असल्याने अपरान्ह काळदेखील वेगळा असतो. अपरान्ह काळ काढण्यासाठी दिवसाचे पाच समान भाग करावे लागतील. त्या पाच समान भागांना वेगवेगळी नावे आहेत.*
*ती अशी.*
*१) स्थानिक सूर्योदय वेळ*
*२) प्रात:काळ समाप्त*
*३) संगव काळ समाप्त*
*४) माध्यान्ह काळ समाप्त*
*५) अपरान्ह काळ समाप्त*
*६) स्थानिक सूर्यास्त वेळ.*
*ज्याने त्याने आपापली स्थानिक सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ गृहीत धरावी. सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा केली की दिनमान म्हणजेच दिवसाचे एकूण तास येतात. याच दिनमानाचे पाच समान भाग करावेत. त्यानंतर प्रत्येक समान भाग सूर्योदयाच्या वेळेत मिळवित जावा. म्हणजे आपणास क्रमश: प्रात:काळ, संगवकाळ, माध्यान्ह काळ, अपरान्ह काळ व सूर्यास्त या समाप्ती वेळा मिळतील. त्यातील अपरान्हकाळ महत्त्वाचा. उदाहरणार्थ:- आपल्या गावचा सूर्योदय सकाळी ६:०० वाजता व सूर्यास्त सायंकाळी ६:३० वाजता असेल तर दिवसाचे तास झाले साडेबारा. त्याचे पाच समान भाग केले तर अडीच तासांचा एक भाग होतो. सूर्योदयाच्या वेळेत पहिले अडीच तास मिळविले की मिळेल प्रात:समय. समाप्तीचा काळ म्हणजे सकाळचे साडेआठ. त्यात पुढे अडीच तास मिळविले की वाजतात ११. हा झाला संगव काळ. त्यात पुढचे अडीच मिळवायचे. वाजला दीड. हा झाला माध्यान्ह काळ. त्यात पुढचे अडीच मिळविले की वाजतात चार म्हणजेच दुपारी दीड ते चार हा झाला त्या गावचा अपरान्ह काळ. ज्यावेळी कावघास टाकणे प्रशस्त मानले जाते. कावघास टाकण्यासाठी माध्यान्ह काळ समाप्ती वेळेपासून अपरान्ह काळ समाप्तीपर्यंतचा काळ प्रशस्त असतो.*
*🔹श्राद्ध म्हटले की लोकांना अनेक प्रश्न पडतात.*
*एखाद्याचा मृत्यू अधिकमासात झाला असेल तर? श्राद्ध तिथीला ग्रहण असेल तर? श्राद्धाचे भोजन करावे की नाही? जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे...*
*🔹 एखाद्याचा मृत्यू अधिकमासात झालेला असतो. पण तरी त्याचे वर्षश्राद्ध मात्र अधिकमास ज्या महिन्यात असेल त्या नेहमीच्या महिन्यातच करावे.*
*🔹ग्रहण काळात श्राद्ध येत असेल तर ग्रहण वेधाच्या काळात हिरण्य श्राद्ध करावे.*
*🔹माता-पिता जिवंत असताना इतर ठिकाणी श्राद्धाचे भोजन करावयास जायला कोणतीही हरकत नसते.*
*🔹श्राद्धवेळी साधू-संन्यासी, योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक संतुष्ट होतात.*
*🔹अनेकांना श्राद्धाच्या वेळी गोत्र माहीत नसते. मग त्यांनी श्राद्ध करताना ‘कश्यप’ गोत्र उच्चारावे.*
*🔹अनेकांना पितरांची नावे माहिती नसतात किंवा वयोमानाने आठवत नसतात. मग अशावेळी पुरुष पितरांसाठी देवांची नावे घ्यावीत व स्त्री पितरांसाठी नद्यांची नावे घ्यावीत.*
*🔹गरूड पुराणातातील बाराव्या अध्यायात ७० व ७१ क्रमांकाचा एक श्लोक आहे. तो असा...*
*" तस्मात पुत्रेण कर्तव्य षोडशत्रयम भर्तुर्वा कुरूते पत्नी तस्या: श्रेयो ह्यनन्तकम सम्परैतस्य या पत्यु: कुरूते चौर्ध्वदैहिकम क्षयाहं पाक्षिकं श्राद्धं सा सतीत्युचते मया "*
*याचा अर्थ असा आहे, जिला संतान नाही तिने पती हयात नसताना स्वत: श्राद्ध केले तरी चालते. वडील हयात असताना पुत्राची आजोबा-पणजोबा यांच्यासाठी तीर्थश्राद्ध करायची इच्छा असेल तर त्याने त्यासाठी पित्याची परवानगी घ्यावी. पित्याच्या परवानगीशिवाय त्याने ते श्राद्ध करू नये.*
*(संकलित...!)*
श्री गणेशोत्सव*
पुष्प ११
गणपतीला मोदक प्रिय का ?
आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात. बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो. पण जिथं बाप्पा तिथं मोदक हे समीकरण नेहमीच ठरलेलं असतं. सध्या काजू मोदक, उकडीचे मोदक, मोतीचूर मोदक, माव्याचे मोदक, लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पासाठी तयार केला जातो. पण गणपतीला मोदक इतके का आवडतात तुम्हाला माहित आहे का? मोदकांच्या नैवेद्यामागे खास कारणही आहे ती कथा आता पाहू...
.एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाज्यावर पहारा देत होते. जेव्हा परशुराम तिथे पोहचला तेव्हा गणपतीनं त्याला दारात थांबवले. परशुराम रागावून गणपतीशी भांडू लागला. या युद्धात शिवाने दिलेल्या परशुने परशुरामाने गणेशावर हल्ला केला. ज्यामुळे यामुळे गणपतीचा एक दात तुटला. जेव्हा दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला, तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले. मोदक मऊ असतात आणि त्यांना चावण्याची गरज नसते. म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजींनी मोदक खाल्ले. तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला आहे.
मोद म्हणजे आनंद. गणपती नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणतात. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हणतात. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त मोदक अर्थात आनंदही देतात.
गणपतीला 21 मोदक अर्पण केले गेले तर त्यांच्याबरोबर इतर सर्व देवतांचेही पोट भरले जाते. याच कारणामुळे नैवे्द्यात गणपतीला मोदक अर्पण केला जातो. जेणेकरून त्याच्याबरोबर इतर सर्व देवतांचे आशीर्वादही मिळू शकतील.
एकदा गणपती माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यासह अनुसया यांच्या घरी गेले. आई अनुसयाने विचार केला की प्रथम गणपतीला जेवण द्यावे. जेवण वाढल्यानंतरही गणपतीची भूक संपत नव्हती. अनुसयाने विचार केला की जर मी काहीतरी गोड खाऊ घातले तर कदाचित गणपतीचे पोट भरेल. त्यावेळी त्यांनी गणपतीला मोदक खायला घातले. त्यानंतर लगेचच गणपतीचं पोट भरलं आणि मोठा ढेकर घेतला.
आता तुम्ही बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करणार ना ?त्यामुळे फक्त गणपतीचं नाही तर सर्व देव प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल . आजचे हे पुष्प वरद विनायकाचे चरणी समर्पित .
इच्छित मनोरथ सिद्धीरस्तू
श्री गणेशोत्सव*
पुष्प १२
श्री गणेशाला दुर्वा का आवडतात ?
याबाबत एकब कथा सांगितली जाते एकदा यमाच्या नगरात एक मोठा उत्सव होता. त्यास देव-गंधर्वादी लोक आले होते... त्याप्रसंगी तिलोत्तमा नृत्य करीत असता तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला. लाजून दरबारातून तो उठून चालला असता अग्निचा लोळ उसळला व त्यातून 'अनल' नावाचा एक भयंकर राक्षस निर्माण झाला.....
त्या राक्षसाच्या भयंकर आवाजाने त्रिभुवन हादरून गेले आणि डोळ्यातील अग्नीने पृथ्वी जळू लागली. दशदिशा जाळीत, पोळीत, जे काही सापडेल त्याचं भक्षण तो करु लागला.....
हा प्रकार पाहून सर्वजण भयभित झाले. त्या राक्षसाच्या त्रासातून वाचण्यासाठी देव श्रीगणेशाकडे गेले... त्यांची करुणावाणी ऐकून लहान बालकाच्या रुपात गजानन त्यांच्या समोर आला आणि म्हणाला "मला तुम्ही अनलासुरापुढे नेऊन सोडा....".
श्रीगणेशाच्या इच्छेप्रमाणे देवांनी बालगणेशास अनलासुरापुढे नेऊन सोडले. तेथे जाताच छोटा गणेश एकदम पर्वताएवढा महाकाय झाला व त्याने अनलासुराला गिळून आपल्या पोटात टाकले.....
त्यामुळे गजाननाच्या पोटात दाह होऊ लागला... तेव्हा इंद्रादी देव त्या बालकाजवळ आले व त्याच्या पोटातील दाह शांत व्हावा म्हणून प्रत्येकाने काहीना काही दिले.....
इंद्राने शीतल व अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला, म्हणून 'भालचंद्र' म्हटले जाऊ लागले.....
ब्रह्मदेवाने सिद्धी व बुद्धी अशा दोन मानसकन्या निर्माण करुन त्या अर्पण केल्या... विष्णूने आपल्या हातातील थंडगार कमळ दिले, त्यामुळे गणेशास 'पद्मपाणी' म्हटले जाऊ लागले. वरुणाने थंडगार पाण्याचा अभिषेक त्याच्या मस्तकावर केला.....
शंकराने सहस्त्रमस्तकांचा नाग अर्पण केला म्हणून गणेशास 'व्यालबद्धोदर' असे नाव प्राप्त झाले.....
इतके उपहार मिळूनसुद्धा श्रीगणरायाच्या पोटातील आग काही केल्या थांबेना... तेव्हा तेथे आलेल्या ८०,००० ऋषिंनी प्रत्येक २१ अशा हिरव्यागार दुर्वा श्रीगजाननाच्या मस्तकावर अर्पण केल्या, तेव्हा गजाननाचा दाह कमी झाला.....
तेव्हा गजानन म्हणाला, "अनेक उपायांनी माझ्या दाहाचं क्षमन झालं नाही, ते दुर्वांनी झालं, म्हणूनच मी या दुर्वांना प्रिय मानतो... मला त्या अर्पण करणा-याला पुण्य लाभेल"..... आणि तेव्हापासून गणेशाला दुर्वा प्रिय आहेत . जे भक्त श्रद्धेने श्री चरणी दुर्वा अर्पण करतील त्यांना गणेशाचा कृपाप्रसाद लाभेल .दुर्वा 3 दल किंवा 5 दल वाहिल्या जातात .२१ दुर्वांची जुडी गणेशाचे चरणी वाहावी.
हे पुष्प पुण्यनगरीची ग्रामदेवता कसबा गणपती चरणी सश्रद्ध अंतः करणाने समर्पित . सर्व हिंदुस्थानातील नागरिकांचे कल्याण हो सर्व जण समृद्ध हो हिंदुस्थान विश्व विजयी हो . जो जे वांछिल तो ते लाहो सकल प्राणिजात .
ओम गं गणपतये नमः
श्री गणेशोत्सव*
पुष्प १३
गणपती बाप्पाची १०८ नावे
प्रत्येक गणेश भक्तांनी ही १०८ नावे रोज गणपती समोर बसून 10 दिवस घ्यावी शक्य असल्यास दुर्वा किंवा फुले गणपतीस अर्पण करावी . व गणपतीस गूळ खोबरे नैवेद्य दाखवावा व कुटुंब कल्याणार्थ श्री चरणी प्रार्थना करावी
1) ऊँ श्री गणेश्वराय नम:
2) ऊँ श्री गणाध्यक्षाय नम:
3) ऊँ श्री गणप्रियाय नम:
4) ऊँ श्री गणनाथाय नम:
5) ऊँ श्री गणेशाय नम:
6) ऊँ श्री गणपतये नम:
7) ऊँ श्री गणेधीशाय नम:
8) ऊँ श्री गणप्रभवे नम:
9) ऊँ श्री गणस्तुताय नम:
10) ऊँ श्री गुणाप्रियाय नम:
11) ऊँ श्री गौणशरीराय नम:
12) ऊँ श्री गुणेशवराय नम:
13) ऊँ श्री गुणप्रभवे नम:
14) ऊँ श्री गुणिगीताय नम:
15) ऊँ श्री गुणाधाशय नम:
16) ऊँ श्री गुणाधीशाय नम:
17) ऊँ श्री गुणदात्रे नम:
18) ऊँ श्री गुणचक्रधराय नम:
19) ऊँ श्री गुणप्राणाय नम:
20) ऊँ श्री गजाय नम:
21) ऊँ श्री गजरुपधराय नम:
22) ऊँ श्री गजप्राणाय नम:
23) ऊँ श्री गजदन्ताय नम:
24) ऊँ श्री गानकुशलाय नम:
25) ऊँ श्री गानशीलाय नम:
26) ऊँ श्री गानबुद्धये नम:
27) ऊँ श्री गुरुगुणाय नम:
28) ऊँ श्री गुरुप्राणाय नम:
29) ऊँ श्री गुरुश्रेष्ठाय नम:
30) ऊँ श्री संसारसुखदाय नम:
31) ऊँ श्री गौरयानुप्रियाय नम:
32) ऊँ श्री गौरगुणाय नम:
33) ऊँ श्री गौरीप्रिय-पुत्राय नम:
34) ऊँ श्री गदाधराय नम:
35) ऊँ श्री गौरभावनाय नम:
36) ऊँ श्री गोमतीनाथाय नम:
37) ऊँ श्री गोपतये नम:
38) ऊँ श्री गोगणाधीशाय नम:
39) ऊँ श्री गोपगोपाय नम:
40) ऊँ श्री गोलोकाय नम:
41) ऊँ श्री गोत्राय नम:
42) ऊँ श्री गोत्रवृद्धिकराय नम:
43) ऊँ श्री गोत्रपतयें नम:
44) ऊँ श्री ग्रन्थज्ञाय नम:
45) ऊँ श्री ग्रन्थप्रियाय नम:
46) ऊँ श्री ग्रहश्रेष्ठाय नम:
47) ऊँ श्री गीतकाराय नम:
48) ऊँ श्री गीतकीर्तये नम:
49) ऊँ श्री गीताश्रयाय नम:
50) ऊँ श्री गतदु:खाय नम:
51) ऊँ श्री गतसकलपाय नम:
52) ऊँ श्री गतक्रोधाय नम:
53) ऊँ श्री गयानाथाय नम:
54) ऊँ श्री गायकवराय नम:
55) ऊँ श्री सृष्टिलिंगाय नम:
56) ऊँ श्री सर्व देवात्मने नम:
57) ऊँ श्री गजकर्णकाय नम:
58) ऊँ श्री ज्ञानमुद्रावते नम:
59) ऊँ श्री लम्बोष्ठाय नम:
60) ऊँ श्री सर्वमंगल मांग्ल्याय नम:
61) ऊँ श्री निरंकुशाय नम:
62) ऊँ श्री ऋद्धि-सिद्धि प्रवर्तकाय नम:
63) ऊँ श्री एक पाद कृतासनाय नम:
64) ऊँ श्री ओजस्वे नम:
65) ऊँ श्री गृहनाय नम:
66) ऊँ श्री चराचरपतये नम:
67) ऊँ श्री दानवमोहनाय नम:
68) ऊँ श्री धन-धान्यपतये नम:
69) ऊँ श्री नन्दीप्रियाय नम:
70) ऊँ श्री पूर्णानन्दाय नम:
71) ऊँ श्री भद्राय नम:
72) ऊँ श्री मन्दगतये नम:
73) ऊँ श्री यज्ञपतये नम:
74) ऊँ श्री रसाय नम:
75) ऊँ श्री राज्यसुखप्रदाय नम:
76) ऊँ श्री लड्डूक प्रियाय नम:
77) ऊँ श्री लाभकृते नम:
78) ऊँ श्री विश्वतोमुखाय नम:
79) ऊँ श्री विश्वनेत्रै नम:
80) ऊँ श्री शम्भुशक्ति गणेवराय नम:
81) ऊँ श्री शास्त्रे नम:
82) ऊँ श्री सर्वज्ञाय नम:
83) ऊँ श्री सौभाग्यवर्धनाय नम:
84) ऊँ श्री पुत्र पौत्र दाय नम:
85) ऊँ श्री दौर्भाग्यनाशनाय नम:
86) ऊँ श्री सर्वशक्ति भृते नम:
87) ऊँ श्री विद्याधरेभ्यों नम:
88) ऊँ श्री ज्ञानविज्ञानाय नम:
89) ऊँ श्री चतुर्थी पुजनप्रियाय नम:
90) ऊँ श्री अष्टमूर्तये नम:
91) ऊँ श्री महागणाधिपतये नम:
92) ऊँ श्री गजकर्णक नम:
93) ऊँ श्री स्थूलकुक्षि: नम:
94) ऊँ श्री कम्बूकण्ठो नम:
95) ऊँ श्री लम्बनासिकाय नम:
96) ऊँ श्री पूर्णानन्दाय नम:
97) ऊँ श्री त्रिवर्गफलदाय नम:
98) ऊँ श्री देवदेवस्य नम:
99) ऊँ श्री महामना: नम:
100) ऊँ श्री सर्वनेत्रधिवासो नम:
101) ऊँ श्री वृहदभुज: नम:
102) ऊँ श्री लम्बोष्ठो नम:
103) ऊँ श्री महाकाय नम:
104) ऊँ श्री अष्टप्रकृतिकारणाय नम:
105) ऊँ श्री विधाप्रदाय नम:
106) ऊँ श्री विजयप्रदाय नम:
107) ऊँ श्री पुत्र पौत्रदाय नम:
108) ऊँ श्री रक्षोरक्षाकराय नम:
हे पुष्प विश्व कल्याणार्थ चिंतामणी चरणी अर्पण . विश्वात शांतता प्रस्थापित व्हावी बंधुभाव वाढावा सर्व जनात सुख समृद्धी व समाधान प्राप्त हो ही गणेशाचे चरणी प्रार्थना । शुभम भवतु ।।
श्री गणेशोत्सव*
पुष्प १४
गणपतीला शेंदूर , शमी व दुर्वा का वाहतात ? यामागे काय कथा आहेत ?
शमी का वाहतात : सामान्यतः शमीच्या झाडाची पाने शनिदेवाला अर्पण करतात. परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्रीगणेशालाही अर्पण करू शकता. श्रीगणेश पूजेने घर-कुटुंब आणि धन संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. या झाडाची पाने श्रीगणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवाचा वास आहे. गणेश उत्सव काळात गणपतीला शमीचे पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लख होते आणि सर्व दुःख दूर होतात. मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते. काही ज्ञानी व शास्त्र अभ्यासक यांच्यानुसार श्रीगणेश पूजेमध्ये शमीच्या पानांसोबत तांदुळ, फुल आणि शेंदूरही अर्पण करावा.
या दरम्यान खालील मंत्राचा उच्चार करावा...
मंत्र-
त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै।
शमी दलानि हेरम्ब गृहाण गणनायक।।
श्रीगणेशाला शेंदूर अर्पण का करावा?
विविध देवी-देवतांच्या पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये शेंदूराचेही विशेष महत्त्व आहे. विशेषतः शिव कुटुंब आणि महादेवाच्या सर्व अंश अवतारांवर शेंदुर अर्पण करण्याचे महत्त्व आहे. यामागील मान्यता अशी आहे की, शेंदूर महादेवाच्या तेजापासून उत्पन्न झालेल्या पारा धातूपासून बनते. महादेवाचे पुत्र शिगणेशाला शेंदूर अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. खालील मंत्राचा उच्चार करत श्रीगणेशाला शेंदूर अर्पण करावा..
मंत्र-
सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्।।
दुर्वांची महती काय आहे ? किती वाहव्या ?
दुर्वांशिवाय गणेश पूजन अपूर्ण; , महत्त्व, मान्यता आणि कथा
: महादेव शिवशंकरांच्या पूजेत बेलाच्या पानाला महत्त्व आहे; श्रीविष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानांना महत्त्व आहे; त्याचप्रमाणे गणपती पूजनात दुर्वांना अत्याधिक महत्त्व आहे. गणपती दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही, असे सांगितले जाते. दुर्वा पूजनात एवढी का महत्त्वाची आहे? जाणून घेऊया...
माघ महिन्यातील गणेश जयंतीनंतर भाद्रपद चतुर्थीला महादेव शिवशंकरांनी सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा केला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थीला गणेश पूजनाची परंपरा आहे. मात्र, अनेकार्थाने भाद्रपदातील चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. यंदा ,शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी साजरी होत आहे.
एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला, अशी एक मान्यता आहे. या दिवशी विधीपूर्वक गणेश पूजन केले जाते. . गणपती दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही, असे सांगितले जाते.
२१ दुर्वांच्या २१ जुड्या
गणपतीचे पूजन करताना २१ दुर्वांच्या २१ जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा. एका मान्यतेनुसार, विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहव्यात. जसे की, ३, ५, ७, ९ अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो. मनापासून केलेली मनोकामना पूर्णत्वास जाते. विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो. मात्र, गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय असण्यामागे एक कथा सांगितली जाते. गणेश पुराणातील एका कथेनुसार, कौण्डिन्य ऋषींच्या पत्नींनी गणपतीला ज्या दुर्वा अर्पण केल्या, त्याची तुलना कुबेराच्या धनाशीही होऊ शकत नाही, असे नोंदवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अनेक शास्त्रांमध्ये दुर्वांची अद्भूत महिमा वर्णन करण्यात आली आहे. श्रावणातील शुद्ध अष्टमीला दुर्वाष्टमी साजरी केली जाते.
अनलासुर राक्षसाची कथा
एका पौराणिक कथेनुसार, एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या मनोभावना बोलून दाखवली. यावर, पण म्हणून माझे नृत्य थांबवून सगळ्या दरबाराच्या रंगाचा बेरंग कशाला, असे तिने रागाने विचारले. तेव्हा अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. त्या राक्षसाच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. त्याने हसून गडगडाट केला. हे यमधर्मा, माझे नाव अनलासूर. तू तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवलेस, म्हणून मी तूला खाऊन टाकतो. त्याचा तो कानठळ्या बसवणारा आवाज ऐकून यमधर्म घाबरला आणि पळून गेला.
अनलासुर समोर जे दिसेल ते खात सुटला. सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले. विष्णूंनी सर्व देवतांना अभय दिले. तेवढ्यात तेथे अनलासुर आला. त्याला पाहिल्यावर विष्णूही घाबरले. त्यांनी गणपतीचे स्मरण केले. गणपती बालकाच्या रूपाने विष्णूंपुढे प्रकट झाला. हे विष्णू, आपण माझे स्मरण का केलेत, असे विचारत असतानाच अनलासुराने काही देवांना पकडले. सर्व देव आणि ऋषीमुनी सैरावैरा पळू लागले. गजानन मात्र जागचा हलला नाही. मग अनलासुराने गजाननाकडे मोर्चा वळवला. त्याने गजाननाला गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलले. तो गणपतीला गिळंकृत करणार तोच सर्व देवांनी हाहाःकार केला. अनलासुराच्या हातातील त्या बाल गजाननाने एकदम प्रचंड रूप धारण केले. ते रूप फारच विराट होते. त्याचे डोके आभाळाला भिडले. पाय पाताळात रुतले होते. एका क्षणात गजाननाने अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले.
गणपतीच्या सर्वांगाचा दाह
अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीला खूप त्रास होऊ लागला. गणपती स्वःच त्रासात आहे, असे समल्यावर देव, ऋषी, मुनी या सर्वांनी त्यांना जमतील ते उपचार सुरू केले. गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे, म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरू झाले. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला. नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र गजाननाच्या मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होईना.
२१ दुर्वांची जुडी कामी
ब्रम्हदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्याच्या सेवेसाठी उभ्या केल्या. वाळ्याच्या पंख्याने त्या गणपतीला वारा घालू लागल्या. पण कशाचाही उपयोग होईना. गणपतीच्या अंगाचा दाह होत राहिला. गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे, ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले. गजानन म्हणाला की, माझ्या अंगाची आग या दुर्वांमुळे नाहीशी झाली. म्हणून मला दूर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नष्ट होतील. ती व्यक्ती बुद्धिमान होईल. असा गणपतीने वर दिला .
हे गणेश पुष्प गिरिजात्मक गणपती चरणी विश्वकल्याणाचे कामनेसह श्रद्धापूर्वक समर्पण .
शुभम भवतु । कल्याण मस्तु ।।
*श्री गणेशोत्सव*
पुष्प १५
श्री नारद विरचित श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र ...
हे अत्यंत प्रभावी व प्रासादिक स्तोत्र आहे.हे सर्व अबाल वृद्ध ,स्त्री पुरुष म्हणू शकतात किंबहुना हे सर्वांनी रोज पठण करावे किंवा घरात रोज ऐकावे . जर आपण संकटात असाल तर संकल्प सोडून रोज हे २१ वेळा २१ दिवस ऐकावे कोठलीही संकट दूर होते . विद्यार्थ्यांना हे रोज म्हणल्यास मोठे यश येते . विद्यार्थी अभ्यास मध्ये रस घेऊ लागतो .
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।।
तृतीयं कृष्णपिङ्गगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२।।
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।
इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।
हे आज विशेष अनुष्ठान करून भक्तांना या राष्ट्रकार्य म्हणून या स्तोत्राचे किमान 3 वेळा पाठ करून गणेशा चरणी प्रार्थना करावी हिंदुस्थान वरील सर्व संकटे दूर होऊन हे राष्ट्र विश्वात अग्रगण्य व्हावे . शुभम भवतु ।
बुधवार दि. 27 ऑगस्ट ते मंगळवार दि. 2 सप्टेंबर 2025 पर्यंत
ऋतं वदामि सत्यं वदामि
ज्योतिष आणि कर्मकांड हे आपल्या इथे बेमालूम मिसळलेले आहेत की, त्यांना
वेगवेगळ्या स्वरूपात बघणेही आपल्याला मान्य नाही! मुळात काही विद्वानांचे
म्हणणेच असे आहे की, होम-हवन यासारख्या कर्मकांडाकरता मुहूर्त काढण्याकरता
ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली (जे अर्धसत्य आहे). असो. सनातन हिंदू
धर्मात अनेक उपासना पंथ आहेत आणि त्यातील एक अत्यंत प्राचीन व प्रभावी पंथ
म्हणजे गाणपत्य पंथ. इथे हे ही लक्षात ठेवले पाहिजे की, गणपतीला
‘विघ्नहर्ता’ म्हणून देखील संबोधिले आहे. या पंथात गणपतीला केवळ विघ्नहर्ता
किंवा बुद्धीचा देव मानले जात नाही, तर तो परब्रह्म, सर्वश्रेष्ठ देवता
आणि सृष्टिकर्ता म्हणून पूजला जातो. या लेखामध्ये आपण गाणपत्य पंथाची
ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्त्वज्ञान, उपासना पद्धती, वर्तणूकशैली आणि आधुनिक
काळातील महत्त्व यांचा सविस्तर अभ्यास करू.
- गाणपत्यपंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी : गणेश उपासनेचा
इतिहास वैदिक काळापासून आहे. ऋग्वेद, यजुर्वेद व अथर्ववेद यामध्ये गणपतीचे
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लेख सापडतात. गाणपत्य पंथाची स्थापना इसवी
सनाच्या पहिल्या सहा शतकात झाल्याचा अंदाज आहे. पुढे शंकराचार्यांनी शण्मत:
पंथांची रचना केली, त्यात गाणपत्य पंथाचाही समावेश होता. यामुळे या पंथाला
शास्त्रशुद्ध अधिष्ठान मिळाले. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि दक्षिण
भारतात या पंथाचा प्रभाव विशेषत: दिसतो.
- गणेश- परब्रह्मस्वरूप : गाणपत्य पंथानुसार गणेश
म्हणजे सगुण ब्रह्माचा मूर्तरूप आहे. तो सर्व तत्त्वांचा अधिष्ठाता आहे.
त्याच्या रूपातील विविध प्रतीकांना दैवी अर्थ आहे. मोठे डोके – ज्ञान व
विवेक, मोठे कान – ऐकण्याची व समजून घेण्याची क्षमता, सोंड – लवचिकता व
अडथळे पार करण्याची क्षमता, उंदरावर स्वार – इच्छाशक्तीवर नियंत्रण. गणेश
हा भक्ताला केवळ भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक लाभ देणारा देव आहे.
- तत्त्वज्ञानवआध्यात्मिक दृष्टिकोन : गाणपत्य
पंथानुसार ब्रह्म हे एकच आहे व ते गणेशरूप आहे. या पंथात अद्वैतवादाची छाया
असून, ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोगाचा समन्वय आहे. गणेश हा सगुण ब्रह्म
असून त्याच्यातून निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होते, असा दृष्टिकोन आहे.
गाणपत्य संप्रदायामध्ये ज्ञानाची प्राप्ती ही ध्यान, जप, पूजा व उपासना
यामार्फत होते. यामध्ये मूलमंत्र, बीजमंत्र, यंत्र व होमविधी यांचे विशेष
स्थान आहे.
- प्रमुखग्रंथ- गणपती अथर्वशीर्ष : गाणपत्य
संप्रदायातील सर्वात पवित्र ग्रंथ. यात गणेशाच्या ब्रह्मस्वरूपाचे वर्णन
आहे. “त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं ऊद्र:” असे मंत्र यात आहेत. मुद्गल
पुराण – गणेशाच्या आठ स्वरूपांचा उल्लेख. (वक्रतुंड, एकदंत, महोदर) गणेश
पुराण – अत्यंत विस्तृत ग्रंथ. यात गणेशाच्या विविध लीलांच्या कथा आहेत.
- गणपतीउपासनाव साधना : गाणपत्य पंथात उपासना तांत्रिक
पद्धतीने केली जाते. मंत्रजप, यंत्रपूजन, होम व विशेष गणेश यज्ञ केले
जातात. काही उपासक एकाक्षरी मंत्र ‘गं’, तर काही “ॐ गं गणपतये नम:” या
मंत्राचा जप करतात. गणेश यंत्र – विशेषत: गाणपत्य साधक यंत्र ध्यानासाठी
वापरतात. गणहोम – नित्य हवन, गणपती अथर्वशीर्ष पठण याला महत्त्व आहे. व्रते
– गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थीला उपासना विशेष महत्त्वाची.
- गाणपत्यसंप्रदायातीलसंत व गुरु परंपरा : या पंथात
गुरुशिष्य परंपरा आहे. महागणपती उपासक, तांत्रिक गुरु, तसेच सिद्ध पुरुष
वेगवेगळ्या काळात कार्यरत होते. काही प्राचीन गाणपत्य मठ आजही महाराष्ट्रात
कार्यरत आहेत.
- प्रमुखगाणपत्यपीठे : गुजरात – मयूरगिरी मठ, एक प्रमुख
गाणपत्य मठ, अष्टविनायक मंदिरे. महाराष्ट्र – मोरगाव, सिद्धटेक, पाळे.
गणेश मंदिरांचा समूह, कणिपक्कम गणेश मंदिर. आंध्र प्रदेश – स्वयंभू
गणेशमूर्ती, टोक गणपती. तामिळनाडू -तांत्रिक गणेश उपासनेचे प्रमुख केंद्र.
- आधुनिककाळातीलगाणपत्य पंथ : आजही गाणपत्य पंथ भारतात
अस्तित्वात आहे, विशेषत: महाराष्ट्रात. गणेश चतुर्थीला सामाजिक व धार्मिक
स्तरावर विशेष पूजन केले जाते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू
करून गाणपत्य उपासनेला जनआंदोलनाचे रूप दिले. यासोबतच, अनेक तांत्रिक साधक
आजही गणपतीच्या विविध स्वरूपांची उपासना करून सिद्धी प्राप्त करतात,
आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग साधतात. गाणपत्य पंथ हा केवळ एक उपासना पंथ
नाही, तर एक जीवनमार्ग आहे. या पंथाच्या माध्यमातून भक्ताला केवळ भौतिक
सुखच नाही, तर ब्रह्मज्ञान, मुक्ती व आत्मसाक्षात्काराचा मार्ग मिळतो. गणेश
म्हणजे सर्व तत्त्वांचे संपूर्ण रूप. त्याचे स्मरण हेच सिद्धी व बुद्धीचे
रहस्य आहे.

>> आशुतोष बापट
गणेशाची देवस्थाने पाहताना आडेवाटेच्या दैवतांना जरूर भेट द्यावी.
सह्याद्रीच्या डोंगरांचे सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण
असलेल्या कोल्हापूर जिह्यातील इच्छापूर्ती गणेश आणि इंचनालचा गणेश ही
वेगळेपण दर्शवणारी गणेशस्थाने, ज्यांचे दर्शन घ्यायलाच हवे.
महाराष्ट्राच्या दक्षिणेचा जिल्हा कोल्हापूर आणि त्या कोल्हापूरच्याही
दक्षिणेला असलेले तालुके म्हणजे गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा. या तीनही
तालुक्यांना निसर्गाने भरभरून दिलेले आहे. सह्याद्रीच्या डोंगरांचे
सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण असे सगळे यथास्थित प्रकरण
आहे. या ठिकाणी आडवाटेवर फिरताना दोन सुंदर गणेशस्थाने बघावीत अशी आहेत.
त्यांचे स्थान, त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा आणि त्या ठिकाणाचे
नैसर्गिक महत्त्व यासाठी ही दोन ठिकाणे मुद्दाम वाट वाकडी करून बघावीत.
इच्छापूर्ती गणेश- एरंडोल आजरा
कोल्हापूर जिह्यातला आजरा तालुका निसर्गसौंदर्याने नटलेला आणि बहरलेला आहे.
हा सगळा प्रदेश खरं तर दुर्गम म्हणायला हवा. अतिशय रमणीय आणि गूढ असलेल्या
ह्या आडवाटेवरच्या प्रदेशात एक गणेशस्थान आहे एरंडोल इथे. हे
गणेशस्थानसुद्धा काहीसे गूढ म्हणावे लागेल. ही मूर्ती एरंडोल आजरा इथे
पोखरकर महाराजांच्या आश्रमात असलेल्या अष्टकोनी मंदिरामध्ये स्थापित केलेली
आहे. आश्रमात एक विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आणि जाबाली ऋषींची समाधीसुद्धा
आहे. भक्तांनी केलेल्या आर्थिक मदतीमधून हे मंदिर बांधलेले आहे. या
मंदिराला तळघर असून ध्यानधारणेसाठी तिथे बसता येते. अष्टविनायकांच्या
प्रतिमा आठ दिशांना या मंदिरात ठेवलेल्या आढळतात. गर्भगृहात सोळा हात
असलेली, उजव्या सोंडेची, पंचधातूची ही मूर्ती उभ्या स्थितीतली आहे.
मूर्तीचे सोवळे अत्यंत कडक असून पुजारी सोडून कोणालाही गर्भगृहात प्रवेश
करता येत नाही. ही मूर्ती इथे कशी आली याबद्दल एक चमत्कारिक कथा प्रसिद्ध
आहे. तांत्रिक साधना करणाऱया लोकांच्या वापरातली ही मूर्ती होती. चंबळ
इथल्या एका ऋषींच्या जवळ असलेली ही मूर्ती चंबळ-उज्जैन-तंजावर-गोकाक असा
प्रवास करत शेवटी संकेश्वर इथल्या रघुनाथशास्त्राr नामक महात्म्याकडे आली.
रघुनाथ शास्त्राr आजारी पडल्यावर ही मूर्ती एरंडोल आजरा इथले संत तुळशीराम
महाराज पोखरकर यांना द्यावी असा त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. त्यायोगे ही
मूर्ती एरंडोल इथे येऊन पोहोचली. मूर्तीचे तेज आणि तिची शक्ती सहन न
झाल्याने तिचा सुरुवातीला पोखरकर महाराजांना बराच त्रास झाला. परंतु
त्यांचे गुरु काशी येथील आत्मप्रकाशानंद यांनी स्वामींना आश्वस्त केले आणि
त्याचा त्रास बंद झाला. पुढे पोखरकर महाराजांच्या आश्रमातच हे मंदिर बांधून
तिथे मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी प्रसाद म्हणून नारळ फोडला जात नाही तर
गूळखोबरे आणि शेंगदाण्याचे लाडू देवापुढे ठेवले जातात. अनेक भाविकांची
इच्छा पूर्ण करणारा म्हणून याला इच्छापूर्ती गणेश म्हणतात, तर साधकांना मदत
करणारा म्हणून याला मोक्षदाता गणेश असेही नाव आहे. दर संकष्टीला कर्नाटक,
गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाविक दर्शनासाठी इथे येतात.
इंचनालचा गणेश
कोल्हापूर जिह्यातला गडहिंग्लज हा तालुका म्हणजे अनेक निसर्गरम्य ठिकाणे,
किल्ले, मंदिरे यांची रेलचेल असलेला प्रदेश आहे. खरं तर हा काहीसा
दुर्लक्षित भाग म्हणावा लागेल. पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध असूनही या
प्रदेशांबद्दल फारशी माहिती लोकांना नसते. भौगोलिकदृष्टय़ा सुद्धा हा प्रदेश
काहीसा वेगळा पडल्यासारखाच आहे. आंबोलीसारखे प्रसिद्ध गिरीस्थान इथून जवळ
आहे. गर्द झाडी, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि चंदगड, आजरा यासारखे
निसर्गसंपन्न तालुके यांचा शेजार लाभलेला हा भाग. गडहिंग्लजच्या पश्चिमेला
फक्त 7 कि.मी. अंतरावर इंचनाल नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य
लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर या
ठिकाणी गणेशाचे एक सुंदर मंदिर उभे आहे. या मंदिराला बराच इतिहास लाभलेला
आहे. इ.स. 1907-08 साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार श्री. गोपाळ
आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ
सेवा मंडळ, इंचनाळ, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून 1987 ते 1992
या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले. त्यासाठी गोकाकवरून
आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते 4
मे 1992 रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप,
बाजूला बगिचा, महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे हा. इंचनालच्या या
मंदिरातील गणेशमूर्ती बैठी असून तिची उंची अंदाजे सवा दोन फूट एवढी आहे.
काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते. चतुर्भुज
गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे. या
मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावानी जवळ जवळ 9 एकर
बागायती जमीन आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱया गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव
करतात आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा,
बेळगाव इथून भाविक यावेळी इथे दर्शनाला येतात. अत्यंत जागृत आणि नवसाला
पावणारे अशी ख्याती असलेले हे देवस्थान आहे. महागावचे दंडगे (जोशी)
घराण्याकडे गेल्या 300 वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली
आहे. कोल्हापूर-गडहिंग्लज येण्यासाठी बस सेवा विपुल आहे. मुद्दाम वाट वाकडी
करून पर्यटकांनी हा सगळाच परिसर फिरून पाहण्याजोगा आहे.
ashutosh.treks@gmail.com
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)