तिमा :-
गणपतीच्या ३२ मूर्ती :-
गाणपत्य संप्रदाय :-
गणपतीची स्वतंत्र मंदिरे मात्र प्राचीन काळात नव्हती, पंचायतन पद्धतीच्या मंदिरांमध्ये गणपतीची मंदिरे दिसतात. पंचायतन मंदिरे म्हणजे मुख्य मंदिर मध्यभागी आणि त्याभोवती बाकी देवतांची चार उपमंदिरे त्याभोवती अशा स्थापत्यामध्ये मध्यभागी शंकर, विष्णू, देवी किंवा सूर्याचे मंदिर असावयाचे. परंतु गणपती मात्र उपमंदिरातच स्थापन केलेला असावयाचा. साधारणतः गणपतीच्या हातामध्ये पाश, अंकुश, परशु, मोदक वगैरे दिसतात व त्याचे वाहन उंदीर असते. ऋिद्धी व बुद्धी किंवा सिद्धी या त्याच्या दोन बायका, काही शिल्पांमध्ये एक किंवा दोन्ही बायका दिसतात. मांडीवर बसलेल्या स्त्रीच्या हनुवटीला, स्तनांना आणि मांडीला सोंडेने स्पर्श करतानाचे गणपतीचे शिल्प असल्यास त्याला उच्छिष्ठ गणेश असे म्हणतात. नृत्य गणेश किंवा तांडव करणाऱ्या गणपतीची शिल्पेही अनेक ठिकाणी आढळतात. परंतु खजुराहोमधील लक्ष्मण मंदिरामध्ये गणपतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे.
महाभारताचे लेखन करण्यासाठी गणपती आपला लेखनिक व्हावा, अशी मागणी महर्षी व्यासांनी केली. गणपतीने हे कार्य एका अटीवर करण्याचे मान्य केले. ती अट अशी की व्यासांनी त्यांची काव्य रचना करीत असतानाच त्यांनी ती सांगायची आणि गणपतीने ती लिहून घ्यायची, परंतु हे करत असताना व्यासांनी कुठेही अडखळायचे किंवा थांबावयाचे नाही. महाकाव्याची रचना करण्याचे ते काम होते. ते पाठ केलेल्या कवितेप्रमाणे कोणीही सांगणे हे शक्य नव्हते. परंतु व्यासच ते, गुरुचे गुरू, त्यांनी ही अट मान्य करताना गणपतीलाही एक अट घातली की प्रत्येक लोकाचा अर्थ समजूनच त्याने तो लिहावा. याला गणपती तयार झाला. महर्षी व्यास हे काही सामान्य कवी नव्हते. त्यांनी महाभारताची रचना करताना मध्ये मध्ये काही कुट श्लोकांचीही रचना केली. कूट श्लोक महणजे कोडी. ती कोडी इतकी क्लिष्ट असायची की अनेकदा त्याचा अर्थ समजून घ्यायलासुद्धा गणपतीला काही काळ विचार करायला लागायचा. त्या काळामध्ये महर्षी व्यास पुढील काव्याची रचना करून ठेवायचे. असे म्हणतात की ना कधी व्यास अडखळले, ना गणपतीची लेखणी थांबली. (महाभारत, आदिपर्व, अनुक्रमणी पर्व, अ. २)
महाभारतातील तो प्रसंग खजुराहो- मधील लक्ष्मण मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवरील देवकोष्ठात गणपतीच्या शिल्पात साकारला आहे. या शिल्पातील गणपती नृत्यमृद्रेत असून हातातील लेखणीने मांडवरच्या वस्त्रावर लिहिण्याचा जणू अभिनय करतो आहे असे वाटते. कानावर पडलेला प्रत्येक शब्द समजून लिहिताना होणारी एकाग्रता त्यांच्या मुखावरील भाव स्पष्ट दर्शवितात. महाभारतातील तो प्रसंग सूचकतेने साकारण्याचा प्रयत्न कलाकाराने केला असावा असे वाटून जाते.

नृत्यगणेश, खजुराहो
उमामहेश्वरांप्रमाणे आपल्या शक्तीला आलिंगनमुद्रेत मांडीवर घेऊन बसलेल्या गणपतीच्या मूर्ती घडवीत असत. या लखनऊ (सं.सं.एच्. १९) मथुरा (म.सं.सं. १५,१११२) येथें तर अगदीच थोड्या संख्येत आहेत, पण झाशी येथील राणीं महालात मात्र कमीत कमी पांच (सं.सं.डी.एच्. १०, १९, १३, १५, १७) आहेत.
३) पञ्चविनायक पट्ट :-
काशीत लक्ष्मीकुंडाचे बाजूला एक शिलापट्ट ठेवलेला आहे. त्याचे एका बाजूला शेषशायी विष्णू अंकित असून दुसऱ्या बाजूला ओळीने पांच गणपति आहेत. पैकी डावीकडील पहिले तीन द्विभुज असून चौथा नुसता हत्ती व पांचवा चतुर्भुज आहे. हा हत्ती पुरता नूसन फक्त सोंड आणि पुढचे दोन पाय दाखविले आहेत. चार गणपतीच्या मधे असल्यामुळे हा सुद्धा एक गणपतीच आहे यात शंका नाही. याच जागी एक दुसरे लहानसे दगंडी शिखर आहे." तेथे एका बाजूला सहा गणपती कोरलेले आहेत. त्यांत ही पांच चतुर्भुज असून सहावा हत्ती आहे. हत्तीच्या रूपात गणपतीची कल्पना होती हे स्कंदपुराणांतर्गत काशीखंडात आलेल्या गजविनायक या नांवाने पुष्ट होते, सुप्रभेदागमाच्या कथेत शंकर पार्वतीला हत्ती व हत्तीणीच्या रूपांतच मुलगा झाला असे सांगितले आहे." हा गज विनायक तोच तर नसेल?
पांच सोंडा आणि दहा हात हे महागणपतीचे लक्षण आहे. नेपाळी कलेत असा गणपती मिळाला आहे, पण कित्येक ठिकाणी सोंडा असूनही हात मात्र चारच आहेत. काशी येथील धुंडीराजाच्या गल्लीत बंगालच्या रानी भवानीने मंदिर बांधले आहे तेथें पंचमुखी गणेशाची सुंदर प्रतिमा आहे. याला जरी सोंडा पांच असल्या तरी कान दोन व हात चार आहेत, त्यात दांत किंवा ऊसांचा तुकडा, अंकुश, त्रिशूळ व मोदकपात्र आहे. गणपतीजवळ सिंह, उंदीर व मुंगूस असे जीव दिसतात. ही मूर्ती बरीच आधुनिक आहे.
काशीत यक्षविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला हा विशाल गणपती चार हात असणाऱ्या पंचशुंडा गणेशाचाच एक प्रकार आहे, पण येथे कान दहा असून दांतही पांच आहेत. विशेष म्हणजे असे की मधल्या सोंडेच्या दातांवर तीन बारीक हत्ती कोरलेले स्पष्ट दिसतात. गणपतीच्या चार हातांपैकी सामान्य दोन मांड्यांवर आहेत व मागच्या उजव्यात अंकुश व डाव्यात सर्प दिसतो.
दिल्लीत सौ. विमल सेठ यांच्या संग्रहांत असलेली ही काष्ठ प्रतिमा पुन्हा पंचशुंड दशभुज गणपतीचाच प्रकार आहे. गणपतीच्या हातात नीलोत्पल, परशु, खड्ग, शंख, फल, बाण, पाश, वगैरे वस्तू आहेत. विशेष म्हणजे हा एका द्विमुख राक्षसाच्या खांद्यावर बसलेला आहे. राक्षसाची तोंडे शिंगें असलेल्या पशूची असून त्याला आठ हात आहेत. वरील दोन हातानें तो गणेशाचे पाय संभाळत आहे. त्या खालच्या दोन हातांत दंड आहेत. ही कृती दक्षिण भारतीय धरतीची आहे. विद्वानांच्या मतें येथे वाहन म्हणून सिंह जरी नसला तरी हा हेरंबा गणपती असून राक्षस हा विघ्नांचे प्रतीक आहे.
मुशीगंज (बांगला देश) येथून मिळालेला पालकलेंतील गणेश शारदातिलकतंत्रांप्रमाणें हेरंब आहे. हा सिंहावर बसलेला असून याला पांच सोंडा व दहा हात आहेत. दोन हात वर आणि अभय मुद्रेत असून बाकीत माळा, परशू, दांत, पाश, मोदक, वगैरे वस्तू आहेत. हेरंब सिंहावर बसतो.
८) बालगणपती :-
गणेशपुराणांतील वर्णनांप्रमाणें ब्रह्मदेवाला आणि कर्नाट राजाच्या बायकोला गणपतीनें बालरूपांत दर्शन दिले होते. याच पुराणांत दितिपुत्राचे रूपांत याचे नाव महोत्कट असें दिले आहे. रांगत्या बालकृष्णांप्रमाणें रांगणाऱ्या पण चतुर्भुज गणपतीच्या धातू प्रतिमेंचे चित्र एलिसगेटी हिनें आपल्या पुस्तकांत दिले आहे.
हत्तीचे डोके असलेला नररूप गणपती आणि पूर्ण हत्तीच्या रूपांत असलेला गणपती याच्या मधली पायरी म्हणून
कलेच्या क्षेत्रांत स्वतंत्र रूपांव्यतिरिक्त गणपती इतरही अनेक देवताच्या बरोबर मिळतो. या देवतांची संक्षिप्त नोंद खालीलप्रमाणें करता येईल -
१) पार्वती हातांत गणपती असतो.
२) पार्वतीबरोबर सद्योजांत शिव गणपती पाठशिळेवर दिसतो."
३) उमामहेश्वर - बहुतेक कार्तिकेयांबरोबर असतो.
४) नवग्रह - विनायकाची दुष्ट देवतामधेंही मोजणी आहे. त्यामुळे कधी कधी तो नवग्रहपट्टांत दिसतो. (नागपूर सं.सं.ए ७४)
५) सप्तमातृका - एका एका कोपऱ्याला वीणाधर शिव आणि दुसऱ्या टोकाला गणपती आढळतो. कडक झाल
६) कुबेर आणि गजलक्ष्मी - यांच्या जोडीला बसलेला दिसतो (ल.सं.सं.ओ २५१).
७) सर्वतोभद्र शिवलिंग काहीं ठिकाणी शिवपार्वती, सूर्य, वराह, विष्णू याबरोबरच एका बाजूस गणपतीही आढळतो.
८) विष्णू - याच्या बरोबर गणपती दुर्मिळ आहे. आतांपर्यंत फक्त तीन शिल्पांवर हा प्रकार आढळलेला आहे. एक तर बांगला देशांतून मिळालेल्या वराह प्रतिमेंत, " दुसरे डॉ. वाकणकर यांना उज्जयिनीच्या उत्खनांत मिळालेल्या गरुढारूढ विष्णू प्रतिमेंत व तिसरे म्हणजे लखनऊ संग्रहालयांतील एका चिमुकल्या प्रतिमेंत
(ल.सं.सं. ६५.१४२)
९) देवीच्या पायाखाली गजानन किंवा हस्तिमुख पुरुष अशा प्रकारची आपल्या माहितींत असलेली फक्त दोन शिल्पें आहेत व दोन्ही मध्यप्रदेशांतूनच मिळाली आहेत. प्रथम शिल्प भेडाघाटच्या गौरीशंकर मंदिराप्त आहे. येथे गणेशशक्ति (स्त्री रूपांत गणेश) चतुर्भुज असून एका आसनांवर बसली आहे व त्या आसनाला द्विभुज वात गजानन खालून टेकू देत आहे. दुसरी प्रतिमा हिंगलाजगढ येथून मिळाली असून तूर्त भोपाळच्या राज्य संग्रहालयांत आहे (सं.सं. १४.१८). ही देवी दशभुज असून तिनें उचललेल्या उजव्या पायाखाली तलवार घेतलेला एक गजमुख पुरुष पडला आहे. देवीचा पानपात्र घेतलेला साधारण उजवा हात सोडून बाकीचे तुटलेले आहेत.
बहुतांशी देवांना साधारण एक पत्नी आणि एक व अधिक शक्ती कल्पिले गेल्या आहेत. ब्रह्मदेवाने तीन वर किंवा मूल्ये म्हणून रिद्धी, सिद्धी व बुद्धी गणपतीला प्रदान केल्या आहेत असे मानले जाते. त्यांनाच स्त्री स्वरूपात कल्पून गणेशाच्या बाजूला आपल्याला रिद्धी व सिद्धी यांचे अंकन दिसते. असे अंकन पेशवे काळापासून पुढे सामान्यतः सापडते पण त्याचे काही पूर्व मध्ययुगीन अंकन औंढा, हिंगोली येथील नागनाथ ज्योतिलिंग मंदिरावर ही आढळून येते. अनेक ठिकाणी त्यानं पत्नी मानत नसल्यामुळे त्यांना गणेशाच्या दोन्ही बाजूस उभे दाखवण्याची पद्धत आहे.
# रिद्धीसिद्धी समावेत गणेश- नागनाथ मंदिर, औंढा, हिंगोली, महाराष्ट्र 12 वे शतक
# शक्ती गणेश- मध्यप्रदेश- बारावे शतक- खाजगी संग्रह
नारद पुराणात "उच्छिष्ट गणपती उपासना" दिलेली आहे ज्यात विविध गणेश व त्यांच्या शक्तींची नांवे उद्धृत केली आहेत. तसेच, ब्रह्मांड पुराण व शारदातीलक या ग्रंथांमध्येही गणेश व शक्तींची नावे आढळतात.
4. चौथी परंपरा- शारदा गणेश:
महात्मा फुले मंडई (पूर्वीचे रे मार्केट) येथे नथुराम डोंगरे पैलवान म्हणू प्रसिद्ध होते. तुळजापूरची तुळजाभवानी ह्या त्यांच्या कुलदेवतेला त्यांनी संतती होण्यासाठी नवस केला व संतती झाल्यावर पूर्ण केला. त्या मंदिरावरील शारदा गणेशाची मूर्ती त्यांनी पहिली होती. आख्यायिका सांगते की देवी तुळजाभवानी, डोंगरे यांच्या स्वप्नात येऊन यांना शारदा गणेशाची मूर्ती निर्माण करून तिची पूजा करावयास सांगून गेली. त्याप्रमाणे त्यांनी ही वेगळी शारदा गणेशाची मूर्ती, नाईक कुंभार यांना घडवायला सांगितली. ही कागदी लगद्यापासून केलेली मूर्ती घडवताना सांगलीचे संस्थानिक, पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले.
गणपती आणि आंब्याची डहाळी (आम्रलुंबी) :-
उत्तरभारताच्च्या गणेश प्रतिमांचे विवेचन संपविण्याचे आधी काहीं प्रतिमांतील एका वैशिष्ट्यांकडे नजर टाकणे आवश्यक आहे, व तें म्हणजे पाल कलेंतील बऱ्याच गणपतीचा आंब्याशी असलेला संबंध. येथील कित्येक प्रतिमांत (उदा. नालंदा संग्रहालयातील तीन संख्यक मूर्ती; लॉस एंजिलिस कांउटी संग्रहालयांतील अष्टभुज नृत्य विनायक वगैरे) वरच्या टोकांवर फळें असलेली आंब्याची डहाळी लोबतांना दाखवितात. दक्षिण भारतांत गणपती आम्रवृक्षाच्या खाली बसून बालगणपती, भक्ती गणपती, वगैरे रूपांत आंबाच त्याच्या हातांत असतो.
आंबा व गणपती याचा परस्पर संबंध अजून लक्षांत येत नाही. पार्वतीचे जैन संस्करण अर्थात सिंहावर बसलेली अंबिका आपल्या हातांत आम्रलुंबी घेतलेली दिसते. या अंबिकेचा व ब्राह्मण धर्मातील गणपतीचा दुवा कुठें सांधला जातो हे अजून स्पष्ट झालेले नाही.
दक्षिण भारतांत गणेश :
महाराष्ट्रांत गणपतीची उपासना बरीच आहे व कित्येक कुटुंबाचे कुळदैवतच गणपती आहे. महाराष्ट्राचे अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. मूर्तीच्या दृष्टीनें विचार केल्यास आपल्याकडें उजव्या व डाव्या सोंडेचा जास्त विचार करतात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे जास्त कडक अशी समजूत आहे.
शिवराममूर्ति यांच्या मतें दक्षिणेंत जुनें गणपती तेलगू आणि कन्नड भागांत मिळाले आहेत. इकडच्या गणेशाचे वैशिष्ट्य त्याच्या सोंडेंत आहे. तमिळ देशांतील पल्लव चोल आणि काही नंतरच्या गणेश शिल्पांत गणपतीची सोंड सरळ लोंबत असून मोदकाचा स्वाद घेण्याकरितां तिचे खालील टोक डावीकडे वळलेले दिसते, या उलट कानडी गणपतीची सोंड वरूनच सामावर्त होऊन मोदक पात्रांपर्यंत पोचते.बदामीच्या गुंफेतील सहाव्या शतकातील गणेश मुर्ती, इथे गणपती दोन भुजा असलेला आहे१३ व्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील चार भुजा असलेल्या गणेशाची कास्य मुर्तीहंपी येथील गणेश मुर्ती
उत्तरेंप्रमाणेंच दक्षिणेंतही पूर्वी व पश्चिमी चालुक्यांच्या राजवटीत गणपतीचे गंडस्थळ आपल्या नैसर्गिक रूपांतच दिसते पण इतरत्र गणपतीला डौलदार मुगुट घातलेला असतो. हळेबीडच्या होयसळ कलेंत गणपती अलंकारानी नटलेला दिसतो. आता काही मुख्य प्रकारच्या प्रतिमाचा विचार करू.
दक्षिणेत सुब्रह्मण्यांप्रमाणेंच विघ्नेश्वराचीही देवळें भरपूर आहेत. यांत बसविलेल्या चतुर्भुज गणपतीच्या प्रतिमा सामान्या असतात. बालगणपती, तरुण गणपती, भक्तीगणपती, वगैरे चतुर्भुज रूपांचेच प्रकार होत."
तांत्रिक ध्यानांत सोळा हातांचा वीर विघ्नेश, लक्ष्मी-गणपती, महागणपती, उच्छिष्ट गणपती, ऊर्ध्वगणपती, पिंगल गणपती, इत्यादि प्रकार क्रियाकर्मद्योति, मंत्रमहोदधी, वगैरे ग्रंथात आढळतात. नृत्यगणपती, व हेरंब गणेश हेही प्रकार दक्षिणेंत रूढ होते.
कुबेर गणपती आणि लक्ष्मी यांचे त्रिकूट आपण उत्तर भारतात पाहिले आहे, पण दक्षिण भारतात लक्ष्मी गणपतीच्या मांडीवर बसलेली असते. उमामहेश्वरांप्रमाणे आलिंगन मूर्तीचा हा एक प्रकार आहे.
उच्छिष्ठ गणपती : -
उच्छिष्ठ गणपतीची दक्षिणेंत बरीच उपासना होत असावी. मंत्रमहार्णवांप्रमाणें हा चार हाताचा असून त्यांत बाण, धनुष्य, पाश आणि अंकुश ही आयुधे असावयास पाहिजेत. त्याला आलिंगन देणारी अकंगता शक्ती निर्वसना असून गणपतीची सोंड तिच्या गुप्तांगाकडे वळलेली असते. उत्तरेकडे या प्रतिमा कमी मिळतात पण दक्षिणेकडील काही प्रतिमांची श्री. राव यांनी चित्रे दिलेली आहेत उच्छिष्ठ गणपतीचे एक सुंदर काष्ठशिल्प (तामिळनाडू, १७ व शतक) राजा केळकर संग्रहालय, पुणे येथे आहे ). चतुर्भुज गणपती डावी मांडी घालून व उजवा पाय खाली सोडून बसलेला आहे. डाव्या मांडीवर देवी असून सोंडेने योनिस्पर्श करणाऱ्या गणेशाच्या हातांत कमळाची कळी, दांत, शंख आणि आलिंगन आहे. आजूबाजूला वाडगा घेतलेले गण, उडणारे यक्ष, वगैरे आहेत.
उच्छीष्ट गणपति, नंदनगुड
विदेशांत गणपती : -
गणेशोपासना भारताच्या बाहेर खोतान, अफगाणिस्तान, कोरिया, जावा, सुमात्रा, वगैरे शेजारच्या देशांतही बरीच पसरली होती, त्यामुळे गणपतीची अनेक शिल्पें इकडेही मिळतात,प्रम्बानन , जावा , इंडोनेशिया मधील ९ व्या शतकातील गणेश मुर्तीचाम संग्रहालय दानंग ,व्हिएतनाममधील ८ व्या शतकातील गणेश मुर्तीभारतातून परदेशाशी जे व्यापारी आणि सांस्कृतिक संबध निर्माण झाले होते, त्यातून इथले देवता परदेशी भुमीवर पोहचले. भगवान गणेशाची पुजा मुख्यत्वेकरुन व्यापारी लोक मोठ्या प्रमाणात करायचे. साधारण दहाव्या शतकानंतर जो व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला त्याचा परिणाम म्हणून गणेशाचा परदेशात प्रसार झाला. कोणत्याही कार्याच्या आरंभी गणेशाचे स्मरण करायची प्रथाही रुजली. या दरम्यान अग्नेय आशियामध्ये या व्यापार्यांनी गणेश मुर्तीचा मोठा प्रभाव निर्माण केला. यामुळे आज फिलीपाईन्स, जावा, बाली, बोर्निओ या देशात भगवान शिवाच्या मंदीराजवळ गणेशाची मुर्ती पहायला मिळते. अर्थात या मुर्तीमध्ये स्थानिक कलाकारांचा प्रभाव हि दिसून येतो. तसेच म्यानमार ( पुर्वीचा ब्रम्हदेश ), थायलँड, कंबोडीया या देशातही गणपति हि विघ्नहर्ता म्हणून मान्य झाला. भारत आणि चीन मधील प्रदेशात तर बौध्द आणि गणेशाचा सारखाच प्रभाव निर्माण झाला. इंडोनेशिया सारख्या मुस्लिम बहुल देशात भगवान गणेशाची पुजन केले जात नाही,मात्र गणपतिली तिथे ज्ञान, बुध्दी, शिक्षणाचे प्रतिक मानले जाते. इंडोनेशियातील अनेक शाळा, महाविद्यालयात गणेशाची मुर्ती दिसते. इंडोनेशिया हा एकमात्र असा देश आहे, ज्यांनी आपल्या नोटेवर गणेशाला स्थान दिले आहे. मात्र हि नोट २००८ नंतर चलनात नाही. तिबेटमधील गणेश मुर्ती ज्याला महारक्त म्हणले जातेनेपाळ, थायलँड, जपान मधील कांगितान मुर्तीइंडोनेशियातील सलातीगाचे राज्यचिन्ह म्हणून गणेश चित्र
अफगाणिस्तानात इस्लामच्या आगमनापुर्वी भारताबरोबर उत्तम संबध होते. इथे बौध्द आणि हिंदू देवतांची पुजा केली जात होती. ४ थ्या आणि ५ व्या शतकात सापडलेल्या मुर्तिचा विचार केला तर इथे नक्कीच गणपतीची पुजा केली जात होती. बौद्ध धर्मातील गणेश :- बौद्ध धर्मात महायान पंथीयात गणेश केवळ बौद्ध देव विनायक म्हणूनच नव्हे तर त्याच नावाच्या हिंदू राक्षसी रूपात देखील आढळतो. गुप्त काळाच्या उत्तरार्धातील बौद्ध शिल्पांमध्ये त्यांची प्रतिमा दिसते. बौद्ध देव विनायक म्हणून, त्याला अनेकदा नृत्य करताना दाखवले जाते. नृत्य गणपती नावाचा हा प्रकार उत्तर भारतात लोकप्रिय होता आणि नंतर नेपाळ आणि नंतर तिबेटमध्ये स्वीकारला गेला. नेपाळमध्ये, हेरंब म्हणून ओळखले जाणारे गणेशाचे रूप लोकप्रिय आहे; त्याला पाच डोकी आहेत आणि तो सिंहावर स्वार होतो. गणपती (बौद्ध धर्मात विनायक म्हणूनही ओळखला जातो) हा बौद्ध धर्मात वज्रयान पंथीयात देवता म्हणून स्वीकारला गेला आणि गणपती (तिबेटी: त्शोग्स् बदाग) तिबेटी मुळ बौद्ध देवतांमध्ये आणखी एक देवता म्हणून स्विकारला गेला. तिबेटी बौद्ध धर्मग्रंथांमध्ये गणेशाशी संबंधित तीस ग्रंथ आहेत. या ग्रंथांमध्ये, जे तिबेटी भाषांतरांमध्ये जतन केलेले भारतीय ग्रंथ आहेत, गणपतीला संपत्तीची देवता म्हणून चित्रित केले आहे जो लैंगिक आणि भोजन यासारखे सांसारिक सुख देखील प्रदान करू शकतो. त्याला नकारात्मक शक्ती, राक्षस आणि रोगांपासून संरक्षण करणारा म्हणून देखील चित्रित केले आहे. या तांत्रिक बौद्ध पंथामध्ये, गणेशाला सामान्यतः बोधिसत्व अवलोकितेश्वराचा अवतार म्हणून सादर केले जाते. तिबेटमधील लाल नृत्य गणपति, १५ वे शतक
महारक्त गणपति
विघ्नान्तकावर आरुढ झालेला विनायक
थायलँडमधील वाट थाम नाकरात मधील गणेश आणि अन्य भारतीय देवता
तिबेटी शैलीतील गणपति चित्र थांगका, चेंगदू, चीन
दाइशो-इन मंदिरमधील बेनज़ायटेन (उजवीकडे ), कांगिटेन (मध्यभागी ) आणि तामोंटेन (डावीकडे ) ( इत्सुकुशिमा , हिरोशिमा राज्य )
श्वेत गणपति, तिबेट
चीन आणि जपानमध्येही गणेश वेगवेगळ्या प्रादेशिक स्वरुपातमध्ये दिसतो. उत्तर चीनमध्ये, गणेशाच्या सर्वात जुन्या ज्ञात दगडी प्रतिमेवर ५३१ चा शिलालेख आहे. जपानमध्ये, जिथे गणेशाला कांगितेन म्हणून ओळखले जाते, तेथे गणेश पंथाचा प्रथम उल्लेख इ.स. ८०६ मध्ये झाला. आज बौद्ध थायलंडमध्ये, गणेशाला संकट दूर करणारा आणि यशाचा देव म्हणून देखील पूज्य मानले जाते. थायलंडमध्ये गणेशाची पूजा प्रामुख्याने कला आणि विद्या यांची देवता म्हणून केली जाते. ही श्रद्धा चक्री राजवंशातील राजा वजिरवुद्ध यांनी सुरू केली होती, जो वैयक्तिकरित्या गणेशभक्त होता. त्यांनी नाखोन पाथोम प्रांतातील त्यांच्या खाजगी राजवाड्यात, सनम चंद्र पॅलेसमध्ये एक गणेश मंदिर देखील बांधले जिथे त्यांनी त्यांच्या देशातील शैक्षणिक आणि साहित्यिक कार्याला प्रोत्साहन दिले. त्यांनी औपचारिकपणे ललित कला विभागाची स्थापना केल्यानंतर गणेश हा कलांचा देव आहे यावर त्यांचा वैयक्तिक विश्वास प्रबळ झाला. आज, गणेशावर ललित कला विभाग आणि थायलंडच्या पहिल्या प्रमुख ललित कला अकादमीचा शिक्का आहे; सिल्पाकोर्न विद्यापीठाच्या चिन्हात याचे चित्रण केले आहे. जैन धर्म :-जैन धर्माच्या प्रामाणित साहित्यात गणेशाच्या पूजेचा उल्लेख नाही. तथापि, काही जैन लोक गणेशाची पूजा करतात, कारण संपत्तीचा देव कुबेराची काही कार्ये गणेशांनी हाती घेतली आहेत असे या भाविकांची श्रध्दा आहे.हिंदु आणि जैन यांच्यात असलेल्या व्यापारी संबंध या कल्पनेला समर्थन देतात की जैन धर्मात गणेशाची पूजा हि व्यावसायिक संबंध आणि हिंदू धर्माच्या प्रभावामुळे आली. चितोडगड किल्ल्यातील गणेश मुर्ती
सर्वात जुनी ज्ञात जैन गणेश मूर्ती सुमारे ९ व्या शतकातील आहे. १५ व्या शतकातील जैन ग्रंथात गणपति प्रतिमा स्थापिन करण्याच्या प्रक्रियांची यादी आहे. राजस्थान आणि गुजरातमधील काही जैन मंदिरांमध्ये गणेशाच्या प्रतिमा आढळतात. गणपतीच्या मध्यकालीन मूर्ती -
गुप्तोत्तर काळांपासून गणेश प्रतिमांची संख्या व प्रकार वाढले. पाषाण व माती यांच्या बरोबरच रुई (मंदार) चे खोड, चंदन, पोळे व अनेक प्रकारच्या माध्यमांची ही वाढ झाली. या काळांत दोन अथवा चार हात असलेले स्थानक किंवा आसन गणपति सामान्य समजावे. त्याच्या हातात पाश, अंकुश, परशु, मोदक, कमळ, वगैरे वस्तू साधारणतः दिसतात. लक्षणग्रंथांत या प्रकारांचे भरपूर वर्णन मिळते, पण त्या व्यतिरिक्त वाङ्मयांत इतर ही अनेक रूपें उल्लेखिलेली आहेत. उदाहरणार्थ गणेशपुराणांत चार युगांचे चार गणपती खालीलप्रमाणे दिले आहेत.कृतयुग
विनायक
दशभुज
सिंहारूढ
त्रेतायुग
मयूरेश्वर
सहा हात
मोर
द्वापारयुग
गजानन
चार हात
उंदीर
कलियुग
धुम्रकेतू
दोन हात
घोडा
याच पुराणात दुसऱ्या ठिकाणी असा ही उल्लेख येतो की दुरासद नांवाच्या राक्षसाशी युद्ध करतांना गणपतीनें ५६ रूपें घेतली." त्यापैकी काही चार, सहा व दहा हाताची होती आणि सिंह, मोर, उंदीर, वगैरे त्यांची वाहनें होती. हेच छप्पन विनायक म्हणून प्रसिद्ध झाले.
स्कंदपुराणांत (काशीखंड) वानर, सिंह व हत्ती अशा त्रिमुख आणि पंचमुख विनायकाचा उल्लेख आहे. हें पुराण गजविनायकाचाही उल्लेख करते. गणेश पुराणात बाल गणपतीचे वर्णन आहे. स्कंदपुराणाचे माहेश्वरखंड गणेश मूर्तीचे सात्विक, राजस आणि तामस असें वर्गीकरण करून पांच तोंडे व दहा हात असलेला सात्विक, चार हात व सोनेरी रंग असलेला राजस आणि निळ्या रंगाचा तामस होय असे सांगते. गणपतीच्या एक किंवा पाच सोंडा सामान्य आहेत, पण याशिवाय दोन, तीन, किंवा सहा तोंडाचेही गणपती कचित आढळतात. अशा मूर्ती वाराणसी, उत्तर प्रदेश व पाटन, नेपाळ येथे आहेत.तीन सोंडा असलेल्या गणपतीच्या एका शिल्पांत त्याची मुखें वानर, हत्ती आणि गरुडाची आहेत. ही मातीची प्रतिमा शिव श्री कण्ठेश्वर मंदिर. नागांर्जुनीकोण्डा, कर्नाटक येथील प्रकारात आहे.शेषवाहन नृत्य गणेश :- गणपतीचा सहावा अवतार, 'विघ्नराज' याला मुद्गलपुराणांत 'शेष वाहन' असे म्हटले आहे. हिमाचल प्रदेशात मिळालेल्या सुमारे १७-१८व्या शतकाच्या एका प्रतिमेत हातांत घंटा घेऊन सर्पावर नाचणारा चतुर्भुज गणपती दिसतो.
मुषक वाहन नृत्यगणेश :- बंगालमध्ये मिळालेला पालकलेचा अष्टभुज गणेश उंदरावर नाचत असून पायाजवळ असणारे त्याचे साथीदार लक्षणीय आहेत. उजवीकडचा झांज वाजवणारा उंदराच्या कानाचा आहे तर डावीकडचा मृदंग वादक हत्तीच्या कानाचा आहे. देवाच्या डोक्यावर पाच फळे असलेली आंब्याची डहाळी (आम्रलुंबी) आहे
नृत्यगणेश आणि मातृका :- नाचणारा गणपती आणि मातृका यांचा जवळचा संबन्ध दाखवणारी प्रतिहार कालीन कन्नौज आणि फतेहगढ (दोन्ही उत्तर प्रदेश) येथून मिळाली आहेत. कन्नौज प्रतिमेत सहा हाताचा नृत्य गणपती असून त्याच्या चौकटीत तिन्ही बाजूला निरनिराळ्या देवता आहेत. वरच्या भागात वीणाधर शिवासह सप्तमातृका दिसतात. उजवीकडे वरून सिंहवाहिनी दुर्गा आणि गाईसह लहानशी घागर घेतलेला गोपालकृष्ण आहे. त्याचप्रमाणे सोबतच्या डाव्या बाजूला पशुमुखी बाळाला मांडीवर घेऊन बसलेली चतुर्भुज वाराही आणि शंख वाजवणारी एक स्त्री उभी आहे. वाराहीचे पशुमुखी बाळ म्हणजे तिचा पुत्र चंडोच्चंड असावा. नृत्यगणपतीच्या या प्रतिमेच्या पृष्ठ भागावर आजुबाजूला विष्णूमूर्ती असलेली तपस्विनी पार्वती उभी आहे.
दुसरे शिल्प फतेहगढ येथे आहे. हे तूर्त तेथील चित्रगुप्त मंदिराच्या भितीत चिणलेले आहे. अष्टभुज गणपती नाचत आहे. पायाशी दोन साथीदार आहेत. उजव्या बाजूच्या खांबावर चतुर्भुज गजलक्ष्मी, शिव आणि घंटा घेतलेली कौशिकी आहे. डावीकडील खांबावर सरस्वती सिंहावर बसलेली शरसंधान करणारी दुर्गा आणि बाळासह बसलेली एक मातृका आहे. गणपतीजवळ गजलक्ष्मी, सरस्वती, कौशिकी, शरसंधान करणारी दुर्गा यांचे एकत्र अंकन दुर्मिळ आहे.लक्ष्मी गणेश :- पाचसोंडा आणि दहा हात असलेल्या गणपतीच्या मांडीवर कमळ घेऊन बसलेली लक्ष्मी कचितच दिसते. कोणार्क (ओडीसा) येथून अशी प्रकारची प्रतिमा मिळाली आहे. गणपतीच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी आहे. दोघांच्या पायाखाली त्यांची वाहने उंदीर व हत्ती दिसतात. त्याचप्रमाणे गणपतीच्या माथ्यावर फळे असलेली आम्रलुंबी आणि त्याच्या मुख्य सोंडेत धरलेला उपडा घट ही विशेष उल्लेखनीय आहेत.लक्ष्मी गणेशाची काष्ट मुर्ती
चौमुखी गणेश, जवळगाव, यवतमाळ
भारतीय संस्कृतीत गणरायाचे सर्वोच्च स्थान आहे. आपणास एकमुखी गणेशाचे लोभस रूप ज्ञात आहे. परंतु नेर तालुक्यातील
ऐतिहासिक दुर्लक्षित जवळगाव येथे प्राचीन व दुर्मिळ गणेशाची चतुर्मुखी
पुरातन मूर्ती आढळली आहे. विदर्भात अशा तीनच प्रतिमा असल्याने याला प्राचीन
काळात विशेष महत्त्व असावे. म्हणून याबाबत पुरातत्त्व विभागाकडून
संशोधनाची गरज आहे.नेर तालुक्यात प्राचीन गणेशाचे स्थान असूनही ते उजेडात आलेच नाही. तालुक्याला मोठा सांस्कृतिक व आध्यात्मिक
वारसा आहे. काही गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होत असून, त्यांचे संवर्धन
होणे गरजेचे आहे. जवळगाव येथे आढळलेली प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण असून, ती
यासाठी वेगळी आहे की, एकाच पाषाणात चार गणपती प्रतिमा अंकित केलेल्या आहेत.
अशा प्रतिमेला प्रतिमाशास्त्रात 'सर्वतोभद्र' असे म्हणत असून, जवळगावची
प्रतिमा याच प्रकाराची आहे. ती प्रतिमा उत्तमस्थितीत असून, पूर्वी उघड्यावर
असलेली ही प्रतिमा ग्रामस्थांनी लहान मंदिरात स्थानापन्न केली आहे. काळ्या
पाषाणात उत्कीर्ण केलेली ही प्रतिमा अंदाजे ७०० वर्षे प्राचीन आहे. चारही
प्रतिमा चतुर्हस्त असून, अर्धपर्यकासनात बसलेली आहेत. हातात हस्तिदंत,
परशु, अंकुश, मोदक धारण केलेले दाखविले आहे. या प्रतिमेचे दुसरे वैशिष्ट्य
म्हणजे चारही प्रतिमांच्या मस्तकावर सुंदर नक्षीकाम केलेला भव्य व सुंदर
मुकुट आहे. या मुकुटामुळे दुरून बघितल्यास ही गणेशाची सर्वतोभद्र प्रतिमा
छोट्या मंदिराची प्रतिकृती वाटते.गणपतीच्या
इतर अलंकारात अतिशय ठळक दिसणारा अलंकार म्हणजे 'सर्प उदरबंध'. हाताला
केयूर व बाजूबंध आहेत, अशी ही सर्वतोभद्र प्रकारातली प्रतिमा आहे. अशा
प्रतिमा जेथे चार वाटा मिळतात, अशा ठिकाणी स्थापन केल्या जात असाव्यात, असे
तज्ज्ञ सांगतात. म्हणजे वाटसरूंना चार दिशा दाखविण्यासाठीही अशा
प्रतिमांचा प्राचीन काळात शुद्ध व्यावहारिक उपयोग होत असावा. याला पूरक असा
संदर्भ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आढळतो. ज्ञानेश्वरीत 'चतुष्पथीचे
गणपती' म्हणून जो उल्लेख येतो, तो अशा प्रतिमांसंदर्भात असावा, असे
सांगतात.या
मंदिराच्या बाजूला हेमाडपंथी शिवालय आहे. बाजूलाच पूर्वी श्री विष्णूचेही
मंदिर होते. सोबतच गणपतीचेही मंदिर होते. परंतु, आता विष्णू व गणपतीच्या
मंदिराचे केवळ अवशेष आहेत. परंतु, श्रीविष्णू व गणपतीच्या मूर्ती सुस्थितीत
आहेत. गावाच्या पश्चिमेस
आणखी एक हेमाडपंथी मंदिर असून, त्यात श्रीविष्णूची व गरुडाची मूर्ती
स्थानांतरित केली आहे. दोन्ही हेमाडपंथी मंदिर गावचा ऐतिहासिक वारसा जपून
आहे. गावात एक गढी असून, त्याचाही मोठा इतिहास आहे. गावात एक भवानी मातेचे
अर्धपीठ असून, जेठसिंगच्या वंशजांनी ते तुळजापूरवरून आणल्याचे गावातील
ज्येष्ठ नागरिक महादेव गुघाणे व ग्रामपंचायत सदस्य बाळू घोडे यांनी
सांगितले. नेरमधील मानाच्या गणपती मठासोबतच आता या चौमुखी गणेशाची प्रतिमा
मिळाल्याने याचाही विकास व्हावा,पाच सोंडांचा गजविनायक :- हत्तीच्या रूपांत असलेल्या गणपतीची - गजविनायका - माहिती व तशी काही शिल्पें आपण मागे पाहिली आहेत (भामूशा. पान २७७) गुजराथमध्ये मिळालेले सुमारे १७-१८व्या शतकांतील एक काष्ठशिल्प असेच पण थोड्या निराळ्या प्रकारचे आहे. पूर्ण शृंगारलेल्या या लाकडी हत्तीच्या तोंडावर मुख्य सोंडेशिवाय इतरही चार सोंडा दिसतात. पांच सोंडे असलेल्या नराकार गणपतीचा हा 'गजविनायक' रूपांत नवा प्रकार आढळतो. या शिवाय तंत्रांतील ध्यानें आहेत ती वेगळीच. ललाटिबब ते गणेशपट्टी :- आपल्याकडे गुप्तकाळानंतर हळूहळू मंदिरस्थापत्य मोठय़ा प्रमाणावर विकसित होऊ लागले. भारतात शैव, वैष्णव, शक्ती असे विविध पंथ-उपपंथ अस्तित्वात होते. त्यांच्या उपास्य देवतांची मंदिरे बांधली जाऊ लागली. मंदिरे कशी बांधायची, त्यांचे स्वरूप कसे असेल, त्या मंदिरावर कुठल्या मूर्ती आणि त्या कुठल्या ठिकाणी असायला पाहिजेत याचे एक विशिष्ट शास्त्र विकसित होत गेले. मूर्तिकला आणि मंदिरस्थापत्य हे हातात हात घालूनच विकसित होत गेल्याचे दिसते. मूर्ती, मंदिरे यांच्या निर्मितीसाठी विविध शास्त्रीय ग्रंथ निर्माण झाले आणि त्यांतून एक ठरावीक शास्त्रोक्त पद्धती सांगितली गेली. मंदिरस्थापत्यात काही विशिष्ट गोष्टी प्रामुख्याने निर्माण होत गेल्या. गर्भगृहाचे दरवाजे हे विशिष्ट द्वारशाखांनी सजवले जाऊ लागले. त्या द्वारशाखांच्या संख्येवरून त्यांना नेमकी नावे दिली जाऊ लागली. एखादे मंदिर हे कुठल्या संप्रदायाचे आहे हे समजण्यासाठी काही विशिष्ट मूर्तीची निर्मिती विशिष्ट ठिकाणी केली जाऊ लागली. द्वारशाखेच्या डोक्यावर मध्यभागी एक चौकट करून त्यात त्या संप्रदायाच्या देवतेची मूर्ती कोरली जाऊ लागली. त्यावरून अमुक एक मंदिर हे अमुक एका देवता संप्रदायाचे आहे, हे समजायला मदत होत असे. द्वारशाखेच्या डोक्यावरील जागा म्हणजे ‘ललाटावरची’ जागा आणि त्या ठिकाणी असलेली मूर्ती म्हणजे बिंब यावरून त्या ठिकाणाला ‘ललाटबिंब’ असे म्हणले जाऊ लागले. मग विष्णूचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून गरुड दिसतो. देवीचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून क्वचित देवी किंवा कधी कधी गजलक्ष्मी दिसते. तर महादेवाचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून गणपती असतो; परंतु दक्षिण भारतात गेलो तर, अनेक ठिकाणी मंदिर कुणाचेही असले तरीही ललाटबिंबावर गजलक्ष्मीचेच शिल्प पाहायला मिळते. अनेकदा मंदिरातील मूळ मूर्ती परकीय आक्रमणात भग्न झाल्यामुळे किंवा तिथून हलवली गेल्यामुळे गाभारा काही काळ मोकळाच असतो. मात्र कालांतराने त्यात शिवपिंडीची स्थापना केल्याचे दिसून येते. अशा वेळी ललाटबिंबावरून मूळ मंदिर कुणाचे असावे, याचा अंदाज बांधता येतो.मंदीराच्या ललाटबिंबावरील गणेश, ज्यामुळे या पट्टीला गणेश पट्टी असे नाव पडले
महाराष्ट्रात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. गणपती ही देवता इथे लोकप्रिय होत गेली. तसेच गाणपत्य संप्रदायाचा विकास महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यामुळे गणपती या देवतेबद्दल कमालीची श्रद्धा आपल्याकडे दिसून येते. सगळ्या गोष्टींचा कर्ता करविता हा प्रत्यक्ष गजाननच आहे, ही भावना आणि श्रद्धा महाराष्ट्रात फार खोलवर रुजलेली आहे. निरनिराळ्या रूपांत तो भक्तांना दर्शन देत असतो. त्याची नावे आणि रूपे वेगवेगळी असली तरी भक्तांचे रक्षण, हेच त्याचे मोठे कार्य. मग तो कुठल्या रूपात आहे यापेक्षाही तो आपल्या जवळ आहे याची जाणीव भक्तांना जास्त सुखावह असते आणि म्हणूनच आरतीत म्हटल्याप्रमाणे ‘दर्शनमात्रे मनकामना पुरती’ अशी अवस्था भक्तांची होते. एका क्षणमात्र दर्शनाने सगळा थकवा, शीण, नैराश्य पळून जाते. इतर कुठल्याही देवांपेक्षा गणपती हा प्रत्येकाला आपला सखा वाटतो, जवळचा मित्र वाटतो. म्हणूनच त्याला ‘त्वं ब्रह्मा, त्वं विष्णु:, त्वम् अग्नी, त्वम् इंद्र’, असे म्हटले आहे. हे सगळे देव किंवा ती तत्त्वे या एकाच देवतेमध्ये सामावलेली आहेत, अशी भक्तांची पक्की धारणा आहे. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान’ असे तुकोबारायांनी गणेशाबद्दल म्हटले आहे. या सगळ्या गोष्टींचा मंदिरस्थापत्यावरसुद्धा प्रभाव पडला आणि महाराष्ट्रात मंदिर कुणाचेही असो, परंतु काही अपवाद वगळता ललाटबिंबावर गणपतीचेच शिल्पांकन केले जाऊ लागले. मुख्यत्वे यादव साम्राज्याच्या विकासाच्या काळात जी काही मंदिरे महाराष्ट्रात बांधली गेली, त्यांच्या ललाटबिंबावर गणपतीच विराजमान झालेला दिसतो. खरे तर भारतभर इथे विविध देवतांचे अंकन बघायला मिळत असले, तरीही महाराष्ट्रात केवळ गणपतीच दिसत असल्यामुळे पुढे पुढे या स्थानाला ‘गणेशपट्टी’ हेच नाव प्राप्त झाले. ललाटबिंब हे नाव मागे पडून गणेशपट्टी हे नाव महाराष्ट्रात सर्वत्र रूढ झाले. इथे चार हातांचा गणपती एका हाताने अभय देताना दाखवलेला असतो. गणपतीचे विघ्नहर्ता हे रूप याला कारणीभूत असले, तरी पुढेपुढे गणेशाप्रति असलेली अपार श्रद्धा प्रबळ झाली. आता गणपती हे मांगल्याचे प्रतीक झालेले दिसते. जे जे उत्कट, उदात्त, उन्नत ते सर्व गणपतीच्या ठायी एकवटलेले आहे, अशी भक्तांची श्रद्धा! गणपतीचे हेच मंगलरूप त्यानंतर पुढे मोठमोठय़ा वाडय़ांवरसुद्धा दिसून येते. आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्यावर जिथे जुने वाडे असतात, तिथे दरवाजावरील कोनाडय़ात गणेशाचे शिल्प हटकून दिसतेच. या मोठय़ा वाडय़ांच्या दरवाजावर गणपती बाप्पा विराजमान झाला. त्यानंतर साहजिकच घरांच्या दरवाजावरसुद्धा गणपतीचेच अंकन दिसते. यामागे भक्तांच्या दोन प्रकारच्या भावना असू शकतात. एक म्हणजे तो विघ्नहर्ता आहे, त्यामुळे घराच्या दारावर बाहेरच्या बाजूला देवाचे अंकन केलेले असेल तर कुठलेही विघ्न घरात प्रवेश करूच शकणार नाही, ही एक भावना. तर दुसरी भावना म्हणजे गणपती हे मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे आपल्या वास्तूच्या मधोमध आणि उच्च ठिकाणी या मांगल्याची प्रतिमा असायला हवी, ही एक भावना. हरिश्चंद्रगडाच्या गुंफेतील तांत्रिक गणेश ( हा नग्नावस्थेत दाखवला आहे )
किल्ले म्हणजे त्या त्या राजवटीच्या सामर्थ्यांचे प्रतीक! संरक्षणाचे मोठे काम या किल्लय़ांकडे होते. त्यांच्या दरवाजावरसुद्धा आपल्याला गणपतीच दिसून येतील. कधी दरवाजावर, तर कधी प्रवेश करताना बाजूच्या कोनाडय़ात गणेशाचे शिल्पांकन हटकून दिसते. शिवरायांचा देखणा किल्ला राजगड, याच्या सुवेळा माचीवरसुद्धा आपल्याला गणपती विराजमान झालेला दिसतो. म्हणजेच संरक्षण, सामथ्र्य, मांगल्य अशा प्रत्येक वेळी आपल्याला गणेशाचीच मूर्ती बघायला मिळते. जुन्नरजवळ असलेल्या किल्ले चावंडवर एकमेकाला जोडलेली पाण्याची सात टाकी आहेत. त्यातल्या एका टाक्यात उतरायला पायऱ्या आणि पुढे खडकात कोरलेला दरवाजा केलेला आहे. या दरवाजावरसुद्धा एका सुंदर चौकटीमध्ये गजाननाचे शिल्पांकन केलेले आढळते. यावरून त्या टाक्यांपैकी हे एकच टाके काहीसे वेगळे आहे आणि याचे पवित्र जल कदाचित किल्लय़ावरील मंदिरातल्या देवतेच्या अभिषेकाला वापरत असावेत. मांगल्याची ही खूण इथे अशी गणेशाच्या शिल्पांकनातून दिसते.नुरपुर शैलीतील चार भुजा असलेल्या गणेशाचे इ.स. १८१० चे लघुचित्र
पुढे पेशवाईतसुद्धा मंदिरांच्या ललाटावर सर्वत्र गणपतीच पाहायला मिळतो. कोकणात या काळात लहानमोठी बरीच मंदिरे बांधली गेली. कोकणातली मंदिरे ही खास तिथल्या हवामानाला आणि पर्जन्यमानाला अनुकूल अशी असतात. म्हणजे मंदिराला उतरते कौलारू छत असते; परंतु कोकणातल्या अनेक मंदिरांमध्ये सभामंडपावर लाकडी कलाकुसर केलेली दिसते. या लाकडी कलाकुसरीची प्रवेशद्वारे आजही गणेशपट्टीने सजवलेली दिसतात. मुख्य गाभारा दगडी असेल तर त्यावर गणपती असतोच; परंतु त्यापुढचा सभामंडप लाकडी असेल तर त्याच्या चौकटीवरसुद्धा गणपतीचे देखणे शिल्पांकन असते. या सुंदर सजवलेल्या चौकटी आजही आपल्याला कोकणातल्या देवळांत दिसतात. मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणपतीचे गणेशपट्टीवरील स्थान हे आता अबाधित आहे. काळ बदलला, वास्तू बदलल्या तरीसुद्धा गणपती आणि त्याच्या प्रति असलेली श्रद्धा अजूनही तितकीच दृढ असलेली दिसते. आजही नवीन वास्तूचा दरवाजा, मग तो नवीन पद्धतीच्या सदनिकेचा दरवाजा जरी असला तरीही त्यावर आपल्याला गणपतीचे चित्र असलेलीच फरशी बसवलेली दिसते. विघ्नहर्ता देव ते मांगल्याचे प्रतीक असा या देवाचा प्रवास फार सुंदर आहे. तो आपल्याला विविध मंदिरांवरील गणेशपट्टीच्या रूपाने आजही बघता येतो. नवीन कार्य आणि गणपती यांचा संबंध इतका दृढ झाला आहे, की कुठल्याही कार्याची सुरुवात करताना त्या कार्याचा ‘श्रीगणेशा’ झाला असा शब्द रूढ झालेला दिसतो. कुठल्याही वास्तूच्या गणेशपट्टीवरील देवाचे हे स्थान अढळ आहे. सुखकर्ता दु:खहर्ता स्वरूपात गणेशाचा अभयहस्त भक्तांवर कायम आहे.गणेशासोबत नृत्यमग्न उंदीर उंदरी :- गणेशाच्या विविध मोहक शिल्पकृती मंदिरांवर आढळून येतात. यातील नृत्यगणेश तर खुपच सुंदर आहेत. घोटण (ता. शेवगाव जि. नगर) येथील खांबांवर पशु पक्षांची शिल्पे ठळकपणे आढळून येतात. छायाचित्रातील शिल्पाने मला चकितच केले. शिल्पात नृत्य करणारा गणेश आहे. पण त्याच्या सोबत कोण आहे? तर दोन उंदीर दिसत आहेत. कमरेखाली उंदीर आणि वर मनुष्य. यातही परत डाव्या बाजूला आहे ती स्त्री तर उजव्या बाजूला पुरूष. उंदरी नाचत आहे तर उंदीर झांज वाजवत आहे. या मंदिरातील पशुपक्षांची शिल्पे संख्येन जास्त आणि ठळक आहेत. या शिल्पात गणपतीचे वाहन म्हणून छोटासा उंदिर न दाखवता त्याच्या सोबत नृत्य करणारी तेवढ्याच आकाराची ही उंदिर नवरा बायकोची जोडी. या कलाकाराच्या कल्पकतेला सलाम. (या आकृती किन्नरांच्या आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. )ज्ञानेश्वरीतील षड्भुज गणेश :- ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सहा भुजांच्या गणेशाचे वर्णन आलेले आहे. षड् दर्शनांचे रूपक म्हणून या ओव्या आहेत असे मानल्या जायचे. पण गंगाधर मोरजे यांनी संशोधन पत्रिकेत एक लेख लिहून हे केवळ रूपक नसून अशी गणेश मूर्ती प्रत्यक्ष पाहूनच ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहील्या असणार असे प्रतिपादन केले. यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर असलेली अशी गणेश मूर्ती कामाची नसून प्रत्यक्ष महाराष्ट्रातच शोध घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने एक गणेश मूर्ती मोरजे यांनी सर्वांच्या नजरेस आणून दिली (संशोधन पत्रिका, इ.स. १९७२). परांडा किल्ल्यात ही मूर्ती सध्या स्थित आहे. ती नेमकी कुठली आहे सांगता येत नाही.ज्ञानेश्वरीतील ओव्या अशा आहेतदेखा षड्दर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृति ।म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हाती ।।१०।।तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ।।११।।एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु ।तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ।।१२।।आता या वर्णनाप्रमाणे परांडा किल्ल्यातील गणेश मूर्तीकडे आपण बघितल्यास हे वर्णन तिथे चपखल बसते. उजवा वरचा हात खंडित आहे. उजव्या खालच्या हातात भग्न दंत आहे. डाव्या वरच्या हातात कमळ आहे. डाव्या खालच्या हातात मोदकपात्र आहे.ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे कमळ सांख्य दर्शनाचे प्रतिक, खंडित दात बौद्ध मताचे प्रतिक, न्याय दर्शनासाठी हातात परशु आहे (हा हात खंडित आहे), सिद्धांत भेदासाठी अंकुश आहे, उत्तर मीमांसेसाठी रसाळ मोदक आहेत, पूर्व मिमांसेसाठी वरद मुद्रा आहे (हा हातही खंडित आहे). मूर्ती १ मीटर २४ सेमी इतकी मोठी आहे.नृत्य गणेश म्हणून स्थानिकांना परिचित असलेली परांडा किल्ल्यातील ही गणेश मूर्ती इतकी महत्वाची आणि मोलाची आहे. होट्टलच्या नृत्य गणेशाला हे वर्णन जास्त लागु पडते कारण त्याचा अभय मुद्रेतील हात स्पष्ट दिसतो. पण दूसरी अडचण हातातील पद्माची येते. हा गणेशही सहा हातांचा आहे. पण बाकी वर्णन जूळत नाही.ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला सहा हातांचा गणपती..! हिमालयाच्या पहिल्या चढावाच्या टप्प्यातील कांगडा जिल्ह्यांत बैजनाथ गावीं महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.! १९०५ साली झालेल्या भूकंपात हे एकमेव मंदिर ह्या जिल्ह्यांत वाचलें, ही मोठी ईश्वराची कृपा होय.! पूजारी सांगत होते की, १०-१५ मिनिटें शिखरापासून काठीसारखें दोन-चारदा देऊळ डोललें पण अखेरीस सरळ जसेच्या तसेंच उभे राहिलें.! या देवळावर एक लेख असून ते दोन सावकारांनी कोंगडयाच्या एका कडोच राजाच्या कारकीर्दीत बांधलें, असें त्यांत म्हटलें आहे.! मंदिराच्या बाहेरील भागाच्या दगडांवर शिखरापर्यंत देवतांच्या निरनिराळया मूर्ती अलंकारांसह व वाहनादि परिवारासह इतक्या सुन्दर कोरल्या आहेत की, त्या डोळ्यात साठवून ठेवाव्याशा वाटतात.!मंदिराच्या आवारांत शिरतांना दरवाजांत शिरल्याबरोबर दोन्ही बाजूस मूर्ती आहेत एकमारुतीरायाची व एक गणरायाची.! दोन्ही मूर्तींचे स्वरूप अलिकडच्या मुर्तींपेक्षा भिन्न असून मननीय आहेत.! यांत गणरायाची मुर्ती फारच मनोहर असून त्यास सहा हात आहेत.! ते पाहतांच मला ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी सहा हातांचा वर्णन केलेल्या गणरायाची मुर्ती कशी असेल, हे पुष्कळ दिवस न उलगडलेले कोडें मात्र येथे उलगडलें.!ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच्या गणेशनमनाच्या ओव्यांत " षड्दर्शनें म्हणिपती । तेच भुजांची आकृति" इथपासून पहिल्या अध्यायातील १० ते १३ क्रमांकाच्या ओव्यांत जे वर्णन आहे ते खालील प्रमाणे," देखा षड्दर्शने म्हणिपति। तेचि भुजांची आकृतिम्हणऊनि विसंवादें धरिती। आयुधे हातीं ॥१०॥तरी तर्कु तोचि परशु । नितिभेदु अंकुश ॥वेदान्त तो महारसु । मोदक मिरवे ॥११॥एके होतीं दन्तु। जो स्वभावता खण्डितु ॥तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥१२॥मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरू वरदु॥धर्मप्रतिष्ठा तो । अभयहस्तु॥ १३॥" पहिल्या दोन्हीं बाजूंच्या दोन हातांत परशु व अंकुश हीं शस्त्रे वणिली आहेत व तीं तर्क व नीतिभेद हीं सांगितली आहेत.! तिसऱ्या हातांत वेदांतरूपी मोदक आहे आणि चौथ्यांत खण्डित दन्त आहे. हाच वार्तिकांचा बौद्धमत संकेतु' आहे. चार हात झाले.! पांचव्यात पद्म म्हणजे कमल आहे, तो सत्कारवाद आणि सहाव्यांत अभय असून तेंच धर्मप्रतिष्ठा असें म्हटलें आहे.! या सहा हातांना प्रारंभींच्या ओवीत षड्दर्शनें म्हणून याच कारणाने विसंवादरूपी किंवा विसंवादाने आयूधें हातांत घेतली आहेत, असें म्हटलें आहे.! या सर्व वर्णनावरून हात सहा आणि दर्शनें सहा हे निश्चित होतें; पण तीं दर्शनें कोणती आणि आयुधे कोणती येथेच थोडासा घोटाळा होतो.! पण आश्चर्याची गोष्ट की, या बैजनाथाच्या ११ व्या शतकातील मंदिरातील गणरायाची मुर्ती सहा हातांची असून त्यांत हींच आयुधे दिली आहेत.! मागील बाजूच्या दोन हातांत खरी आयुधे म्हणजे परशु आणि अंकुश आहेत.! नंतर डावीकडच्या दोन हातांपैकी खाली केलेल्यांत तुटलेला दन्त आणि मांडीवर ठेवलेल्या सोंडेच्या तोंडाजवळ नेलेल्या हातांत, जणू काय वेदान्त- मोदकाचा रस गजानन सोंडीने चाचपून पहात आहे.! उजवीकडच्या दोन हातांपैकी खाली केलेल्या हातांत कमळ आहे आणि मांडीवर उभा ठेवलेला हात अभयरूपी कल्याण दाखवीत आहे.! तात्पर्य १३०० च्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींनी दक्षिणेंत वर्णिलेल्या षड्भुज गणपतीची मुर्ती १२ व्या शतकाच्या आरंभींच्या कांगडा दरींत असलेल्या हिमालयाच्या पायथ्याशी आपल्यास पहावयास मिळते.!
उत्तरभारताच्च्या गणेश प्रतिमांचे विवेचन संपविण्याचे आधी काहीं प्रतिमांतील एका वैशिष्ट्यांकडे नजर टाकणे आवश्यक आहे, व तें म्हणजे पाल कलेंतील बऱ्याच गणपतीचा आंब्याशी असलेला संबंध. येथील कित्येक प्रतिमांत (उदा. नालंदा संग्रहालयातील तीन संख्यक मूर्ती; लॉस एंजिलिस कांउटी संग्रहालयांतील अष्टभुज नृत्य विनायक वगैरे) वरच्या टोकांवर फळें असलेली आंब्याची डहाळी लोबतांना दाखवितात. दक्षिण भारतांत गणपती आम्रवृक्षाच्या खाली बसून बालगणपती, भक्ती गणपती, वगैरे रूपांत आंबाच त्याच्या हातांत असतो.
आंबा व गणपती याचा परस्पर संबंध अजून लक्षांत येत नाही. पार्वतीचे जैन संस्करण अर्थात सिंहावर बसलेली अंबिका आपल्या हातांत आम्रलुंबी घेतलेली दिसते. या अंबिकेचा व ब्राह्मण धर्मातील गणपतीचा दुवा कुठें सांधला जातो हे अजून स्पष्ट झालेले नाही.
दक्षिण भारतांत गणेश :
महाराष्ट्रांत गणपतीची उपासना बरीच आहे व कित्येक कुटुंबाचे कुळदैवतच गणपती आहे. महाराष्ट्राचे अष्टविनायक प्रसिद्ध आहेत. मूर्तीच्या दृष्टीनें विचार केल्यास आपल्याकडें उजव्या व डाव्या सोंडेचा जास्त विचार करतात. उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे जास्त कडक अशी समजूत आहे.
शिवराममूर्ति यांच्या मतें दक्षिणेंत जुनें गणपती तेलगू आणि कन्नड भागांत मिळाले आहेत. इकडच्या गणेशाचे वैशिष्ट्य त्याच्या सोंडेंत आहे. तमिळ देशांतील पल्लव चोल आणि काही नंतरच्या गणेश शिल्पांत गणपतीची सोंड सरळ लोंबत असून मोदकाचा स्वाद घेण्याकरितां तिचे खालील टोक डावीकडे वळलेले दिसते, या उलट कानडी गणपतीची सोंड वरूनच सामावर्त होऊन मोदक पात्रांपर्यंत पोचते.
उत्तरेंप्रमाणेंच दक्षिणेंतही पूर्वी व पश्चिमी चालुक्यांच्या राजवटीत गणपतीचे गंडस्थळ आपल्या नैसर्गिक रूपांतच दिसते पण इतरत्र गणपतीला डौलदार मुगुट घातलेला असतो. हळेबीडच्या होयसळ कलेंत गणपती अलंकारानी नटलेला दिसतो. आता काही मुख्य प्रकारच्या प्रतिमाचा विचार करू.
दक्षिणेत सुब्रह्मण्यांप्रमाणेंच विघ्नेश्वराचीही देवळें भरपूर आहेत. यांत बसविलेल्या चतुर्भुज गणपतीच्या प्रतिमा सामान्या असतात. बालगणपती, तरुण गणपती, भक्तीगणपती, वगैरे चतुर्भुज रूपांचेच प्रकार होत."
तांत्रिक ध्यानांत सोळा हातांचा वीर विघ्नेश, लक्ष्मी-गणपती, महागणपती, उच्छिष्ट गणपती, ऊर्ध्वगणपती, पिंगल गणपती, इत्यादि प्रकार क्रियाकर्मद्योति, मंत्रमहोदधी, वगैरे ग्रंथात आढळतात. नृत्यगणपती, व हेरंब गणेश हेही प्रकार दक्षिणेंत रूढ होते.
कुबेर गणपती आणि लक्ष्मी यांचे त्रिकूट आपण उत्तर भारतात पाहिले आहे, पण दक्षिण भारतात लक्ष्मी गणपतीच्या मांडीवर बसलेली असते. उमामहेश्वरांप्रमाणे आलिंगन मूर्तीचा हा एक प्रकार आहे.
उच्छिष्ठ गणपती : -
उच्छिष्ठ गणपतीची दक्षिणेंत बरीच उपासना होत असावी. मंत्रमहार्णवांप्रमाणें हा चार हाताचा असून त्यांत बाण, धनुष्य, पाश आणि अंकुश ही आयुधे असावयास पाहिजेत. त्याला आलिंगन देणारी अकंगता शक्ती निर्वसना असून गणपतीची सोंड तिच्या गुप्तांगाकडे वळलेली असते. उत्तरेकडे या प्रतिमा कमी मिळतात पण दक्षिणेकडील काही प्रतिमांची श्री. राव यांनी चित्रे दिलेली आहेत उच्छिष्ठ गणपतीचे एक सुंदर काष्ठशिल्प (तामिळनाडू, १७ व शतक) राजा केळकर संग्रहालय, पुणे येथे आहे ). चतुर्भुज गणपती डावी मांडी घालून व उजवा पाय खाली सोडून बसलेला आहे. डाव्या मांडीवर देवी असून सोंडेने योनिस्पर्श करणाऱ्या गणेशाच्या हातांत कमळाची कळी, दांत, शंख आणि आलिंगन आहे. आजूबाजूला वाडगा घेतलेले गण, उडणारे यक्ष, वगैरे आहेत.
गणेशोपासना भारताच्या बाहेर खोतान, अफगाणिस्तान, कोरिया, जावा, सुमात्रा, वगैरे शेजारच्या देशांतही बरीच पसरली होती, त्यामुळे गणपतीची अनेक शिल्पें इकडेही मिळतात,
महारक्त गणपति
विघ्नान्तकावर आरुढ झालेला विनायक
थायलँडमधील वाट थाम नाकरात मधील गणेश आणि अन्य भारतीय देवता
तिबेटी शैलीतील गणपति चित्र थांगका, चेंगदू, चीन
दाइशो-इन मंदिरमधील बेनज़ायटेन (उजवीकडे ), कांगिटेन (मध्यभागी ) आणि तामोंटेन (डावीकडे ) ( इत्सुकुशिमा , हिरोशिमा राज्य )
श्वेत गणपति, तिबेट
गुप्तोत्तर काळांपासून गणेश प्रतिमांची संख्या व प्रकार वाढले. पाषाण व माती यांच्या बरोबरच रुई (मंदार) चे खोड, चंदन, पोळे व अनेक प्रकारच्या माध्यमांची ही वाढ झाली. या काळांत दोन अथवा चार हात असलेले स्थानक किंवा आसन गणपति सामान्य समजावे. त्याच्या हातात पाश, अंकुश, परशु, मोदक, कमळ, वगैरे वस्तू साधारणतः दिसतात. लक्षणग्रंथांत या प्रकारांचे भरपूर वर्णन मिळते, पण त्या व्यतिरिक्त वाङ्मयांत इतर ही अनेक रूपें उल्लेखिलेली आहेत. उदाहरणार्थ गणेशपुराणांत चार युगांचे चार गणपती खालीलप्रमाणे दिले आहेत.
कृतयुग | विनायक | दशभुज | सिंहारूढ |
त्रेतायुग | मयूरेश्वर | सहा हात | मोर |
द्वापारयुग | गजानन | चार हात | उंदीर |
कलियुग | धुम्रकेतू | दोन हात | घोडा |
स्कंदपुराणांत (काशीखंड) वानर, सिंह व हत्ती अशा त्रिमुख आणि पंचमुख विनायकाचा उल्लेख आहे. हें पुराण गजविनायकाचाही उल्लेख करते. गणेश पुराणात बाल गणपतीचे वर्णन आहे. स्कंदपुराणाचे माहेश्वरखंड गणेश मूर्तीचे सात्विक, राजस आणि तामस असें वर्गीकरण करून पांच तोंडे व दहा हात असलेला सात्विक, चार हात व सोनेरी रंग असलेला राजस आणि निळ्या रंगाचा तामस होय असे सांगते.
चौमुखी गणेश, जवळगाव, यवतमाळ
नृत्य गणेश (होट्टल, ता. देगलूर, जि. नांदेड) :
होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्यअंगावर उत्तरेला ही अप्रतिम अशी नृत्य गणेशाची तीन फुट उंच सुबक मूर्ती आहे. हा सहा हातांचा गणेश आहे. उजव्या बाजूला वरच्या हातात परशु आहे. उजव्या मधल्या हातात भग्नदंत आहे. डाव्या बाजूला वरच्या हातात नाग आहे. डाव्या मधल्या हातात मोदक आहेत. खालचे दोन्ही हात सुंदर अशा नृत्यमुद्रेत आहेत. डाव्या हाताच्या या मुद्रेला "गजहस्त" असे म्हणतात. डावा पाय जमिनीवर समर्थपणे रोवलेला आहे याच्या नेमकं उलट उजव्याचा केवळ अंगठाच कलात्मकरित्या वळवून जमिनीवर टेकवला आहे. अगदी असं वाटतं प्रत्यक्ष गणराज नाचत असताना त्याचे छायाचित्र घेतले आणि त्या छायाचित्रावरून हे शिल्प कोरले. मेखलेची मी माळ मध्यभागी खाली सुटली आहे ती बरोबर डावीकडे झुकली आहे. केवळ स्थीर उभा गणेश असता तर ही माळ ओळंबा रेषेत जमिनीच्या दिशेने सरळ दाखवली असती. माथ्यावरच्या मुकुटाच्या झिरमाळातील मध्यभागीचे पदकही जरा डावीकडे झुकलेले दाखवले आहे.डावा पाय सरळ असल्याने ती मेखला खाली दिसते आहे तर उजवा पाय वर उचलला असल्याने मेखलेची माळ वर सरकली आहे. शिल्पकाराची खरेच कमाल आहे. गणेशाचे वाहन मुषक खाली उजव्या बाजूला आहे. या भागातील अशा काही कलात्मक मूर्तीतून संगीत या प्रदेशात समृद्ध असल्याचे पुरावे मिळतात.रुद्रेश्वर लेण्यातील गणेश :- आता आपण माहिती घेणार आहोत, एका लेण्यातील गणेश मुर्तीची ! अजिंठ्याच्या डोंगरांमध्ये निसर्गरम्य अशा परिसरात एकूण ५ किल्ले आहेत. प्राचीन लेण्या, मंदिरे, जंगल यांनी हा परिसर समृद्ध आहे. बहुतेकांना केवळ अजिंठ्याचीच माहिती असते. अगदी अजिंठा गावाचीही माहिती नसते. ही गणेशमुर्ती अजिंठा डोंगरांतील वेताळ वाडी किल्ल्या जवळील रूद्रेश्वर लेण्यांतील आहे. अजिंठा गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला एक रस्ता ‘अजिंठा व्ह्यु पॉईंट’ कडे जातो. या ठिकाणाहून अजिंठा लेणीचे नयनरम्य असे दृश्य दिसते. या रस्त्यावरून पिंपळदरी गावापासून डावीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर हळदा म्हणून गाव आहे. याच हळद्याच्या पुढे वेताळवाडीचा किल्ला आहे. या ठिकाणाला अजिंठा रोडवरून गोळेगांवपासून उंडणगाव मार्गाने पण जाता येते. हा रस्ता हळदा घाटामुळे अजूनच जास्त निसर्गरम्य आहे. वेताळवाडीचा किल्ला यादवांच्या काळातील असून देवगिरी किल्ल्यापेक्षाही प्राचीन आहे. वेताळवाडी किल्ल्याला वळसा घालून सोयगांव रस्त्यावर जाताना वाडी गावांतून एक छोटी वाट रूद्रेश्वर लेणीच्या डोंगराकडे जाते. काही अंतरावर ही कच्ची सडक आहे. वाटेत तीन मोठे खळाळणारे झरे लागतात. ते ओलांडून गेल्यावर रूद्रेश्वर डोंगराची प्रत्यक्ष चढण सुरू होते. या जागेपासून दगड मातीची पायवाट लेणीपर्यंत पोचते. डोंगरमाथ्यावरून कोसळणार्या सुंदर धबधब्याने दगड कापत कापत एक सुबक अशी खोबण तयार केली आहे. याच खोबणीत रूद्रेश्वर लेणी कोरली गेली आहे. ही लेणी अजिंठा लेणीच्या काळातील आहे. म्हणजे जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीची ही लेणी आहे. लेणीसाठी डोंगरावरून उतरणारी एक अवघड अशी पायवाट आहे. लेणीत महादेवाची सुंदर अशी पिंड, समोर सुबक नंदी आहे. या लेणीतील खरे आकर्षण म्हणजे वरच्या छायाचित्रात असलेली गणेशमुर्ती. सहा फुटाची भव्य अशी ही गणेशमुर्ती दगडांत कोरलेली आहे. एकसंध दगडांत कोरलेली इतकी प्राचीन दुसरी गणेशमुर्ती महाराष्ट्रात नाही. उजवा पाय उंचावलेला व डावा पाय दुमडलेला अशी ही देखणी गणेशमुर्ती आहे. कमरेला नागाने वेढा घातलेला आहे. शेंदूर फासल्याने मुळचे सौंदर्य लक्षात येत नाही. मुर्तीची भव्यता डोळ्यांत सहज भरते. समोरच्या दरवाज्यांतून वरून पडणार्या पाण्याचा अखंड नाद कानात घुमत राहतो. गणेशमूर्तीच्या बाजूस दगडी बैठकीवर महादेवाचे शिवलिंग आहे आणि नंदीही आहे, त्यास रुद्रेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिरातच गणेशमूर्ती शेजारी कोरलेल्या दगडात नृसिंहाची मूर्ती व, सप्तमातृक शिल्पे दिसतात. उजव्या खांबावर नरसिंहाचे व डाव्या खांबावर नटराजाचे शिल्प तीन फूट उंचीच्या आकारात कोरलेले आहे. गणपतीच्या बाजूला उग्र नरसिंह असे इतरत्र कुठेच आढळत नाही. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे.अंगारकी व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दर्शनाकरिता भाविक गर्दी करतात. शेजारीच प्रचंड असा पाण्याचा धबधबा कोसळत असतो. वरतून कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते.मुर्तीसमोरच्या छोट्या ओटयावर डोळे मिटून हात जोडून बसल्यास हा पाण्याचा नाद अथर्वशिर्ष उच्चारत असल्याचा भास होत राहतो. ढोलकलचा भगवान गणेश :- जगभरात गणपती बाप्पाची अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. यामध्ये इंडोनेशिया मधील प्राचीन मंदिरांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. त्याशिवाय भारतातही काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते कोहिमापर्यंत गणपतीची शेकडो मंदिरे आहेत. परंतु एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी एका टेकडीवर असलेल्या एका छोट्या, गूढ मंदिराबद्दल खुपच कमी जणांना माहिती आहे. छत्तीसगड राज्यातील रायपूरपासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर दांतेवाडा जिल्ह्यातील ढोलकल नावाच्या डोंगरावर असे मंदिर आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचीवर स्थित असून तिथे पोहोचण्यासाठी अत्यंत अवघड प्रवास करावा लागतो.२०१२ मध्ये एका संशोधक-पत्रकाराने हे मंदिर शोधून काढले. सन १९४३ मध्ये ब्रिटिश भूवैज्ञानिक क्रुकशॅन्कला या जागेबद्दल सर्वप्रथम समजले होते. बैलादीला या खाणीसाठी सर्वेक्षण करताना त्याला ही जागा सापडली होती. क्रुकशॅन्कने तयार केलेल्या दक्षिण बस्तारच्या भूवैज्ञानिक अहवालाचा अभ्यास करून संशोधक-पत्रकार राजीव रंजन प्रसाद यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या साहाय्याने ही मूर्ती प्रकाशात आणली. स्थानिक आख्यायिकेनुसार अनेक वर्षांपूर्वी ढोलकल टेकडीवर भगवान गणेश आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले. या लढाईत परशुरामाने आपल्या परशुच्या साहाय्याने गणेशावर भीषण वार केला आणि त्या आघाताने गणेशाचा एक दात तुटला. यामुळेच या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावाला ‘फरसापाल’ हे नाव पडले. परशुला स्थानिक भाषेत फरसा म्हणतात, हा परशुचाच अपभ्रंश आहे. दोन मोठ्या देवतांमधील लढाई कोणी जिंकली हे अद्याप एक गूढ आहे. परशुराम आणि गणेश यांच्यातील लढाईच्या स्मरणार्थ चिंदक नागवंशी राजाने ११ व्या शतकात डोंगरमाथ्यावर गणपतीची दगडी मूर्ती स्थापन केली. नागवंशी राजाने स्थापना केली असल्याने या मूर्तीच्या गळ्यात आपल्याला नाग असल्याचे दिसून येईल. या मूर्तीची उंची साधारणतः अडीच ते तीन फूट आहे. ढोलाच्या आकाराची टेकडी असल्याने या टेकडीला ढोलकल असे नाव देण्यात आले आहे. ढोलकलमधील ‘कल’ म्हणजे डोंगरमाथा. मूर्तीमध्ये बाप्पाला त्याच्या ठराविक ललितासनात सहजतेने बसलेल्या स्थितीत दाखवले आहे. गणेशाच्या एका हातात परशु आणि एका हातात तुटलेला दात आहे. स्थानिक रहिवासी वर्षभर गणेशमूर्तीची पूजा करतात आणि माघ महिन्यात माघी गणेशोत्सवादरम्यान, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात याठिकाणी जत्रा भरते. मंदिर, गर्भगृह, सभामंडप, कळस अशी कोणतीही इमारत याठिकाणी नाही. जगामध्ये अशा प्रकारे स्थापन केलेली बहुधा ही एकमेव गणेशमूर्ती असावी.पण दगडी गणेशमूर्तीची स्थापना इतक्या उंचीवर करणे म्हणजे मोठे दिव्यच! हे दिव्य कसे पार पडले याबद्दल कोणालाही माहिती नाही. स्थानिक आदिवासी या गणेशाची आपला रक्षक म्हणून पूजा करतात. आदिवासींच्या मते, ढोलकर टेकडीजवळच एका टेकडीवर सूर्यदेवाची मूर्ती स्थापित होती, पण सुमारे १५ वर्षांपूर्वी ती चोरीला गेली. छत्तीसगडमधील माओवाद्यांनी या गणेशाच्या मूर्तीची चोरी केली होती. ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने शोध घेतला. थोड्याच वेळात, अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेली मूर्ती डोंगराच्या खाली सापडली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ८४ वर्षीय अरुण कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ६२ तुकड्यांमध्ये विखुरलेल्या मूर्तीला जोडून जीर्णोद्धार केला आणि पुन्हा गणेशमूर्तीची ढोलकल टेकडीवर स्थापना करण्यात आली. काहींच्या मते ही गणेशमूर्ती उंचीवरून पाडली गेली आणि माओवाद्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या घनदाट जंगलात त्याचे तुकडे झाले.जवळच्याच लहानशा जगदलपूर शहरापासून फरसपाल गावात पोहोचण्यासाठी २ तास लागतात. फरसपाल हे गाव ढोलकर टेकडीवरील गणपतीपर्यंत पोहोचण्यासाठी पायथ्याचे ठिकाण आहे. या मुर्तीपर्यंत पोहचण्यासाठी १६ तासांत चढण चढावी लागते. घनदाट जंगलातून प्रवास करण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घेता येईल. डोंगरमाथ्यावरून दिसणाऱ्या संपूर्ण जंगलाच्या विहंगम दृश्याने शरीराचा थकवा घालवते. भारतातील धार्मिक स्थळांपैकी न चुकता बघण्याचे हे ठिकाण आहे.
कर्नाटकातील अर्ध्या गणपतीची मूर्ती --- उत्तर कन्नडमधील बनवासी ही प्राचीन कर्नाटकाची राजधानी होती. येथे कदंब कुलातील राजांची सत्ता होती. बनवासी हे काशी वाराणसी क्षेत्रा इतकेच प्राचीन आहे. याला दक्षिणेची काशी असे म्हणतात. येथे एक मधुकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर कदंब कुळातील राजा मयूर शर्मा याने बांधले आहे. ते १५०० वर्षांपूर्वींचे असून कर्नाटकातील सर्वात जुन्या देवळांपैकी एक देऊळ आहे. इतर ठिकाणी अत्यंत क्रुद्धमुद्रेत दिसणारा नृसिंह येथे मात्र चक्क शांत व प्रसन्न मुद्रेत पाहायला मिळतो. ऐरावतावर विराजमान असलेली इंद्र आणि शची यांची दुर्मिळ मूर्ती येथे पाहायला मिळते.सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे एक गणेश मंदिर असून येथील गणेश मूर्ती ही अर्धीच आहे. वास्तविक एखादी मूर्ती भंगली तर ते अशुभ मानून अशा मूर्तीचे तात्काळ विसर्जन केले जाते. परंतु येथे मात्र या अर्ध्याच मूर्तीची रोज वर्षानुवर्षे यथासांग पूजा केली जाते. या मूर्तीच्यावर थेट अभिषेक होईल असे एक तांब्याचे अभिषेक पात्र टांगलेले असून अभिषेकानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी शिवपिंडीप्रमाणे व्यवस्था आहे. या मूर्तीचा उरलेला अर्धा भाग हा मूळ काशी शहरामध्ये आहे असे सांगितले जाते. पण मूर्तीचा बहुतांश येथेच भाग आहे. त्यामुळे उरलेला अर्धा भाग काशी नगरीत सापडणे अशक्य आहे असे वाटते.
वैनायकी :–


भुलेश्वर मंदिरातील वैनायकी :-

पाऊलखुणा – वेगळेपण दर्शवणारी गणेशस्थाने

>> आशुतोष बापट
गणेशाची देवस्थाने पाहताना आडेवाटेच्या दैवतांना जरूर भेट द्यावी. सह्याद्रीच्या डोंगरांचे सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण असलेल्या कोल्हापूर जिह्यातील इच्छापूर्ती गणेश आणि इंचनालचा गणेश ही वेगळेपण दर्शवणारी गणेशस्थाने, ज्यांचे दर्शन घ्यायलाच हवे.
महाराष्ट्राच्या दक्षिणेचा जिल्हा कोल्हापूर आणि त्या कोल्हापूरच्याही दक्षिणेला असलेले तालुके म्हणजे गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा. या तीनही तालुक्यांना निसर्गाने भरभरून दिलेले आहे. सह्याद्रीच्या डोंगरांचे सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण असे सगळे यथास्थित प्रकरण आहे. या ठिकाणी आडवाटेवर फिरताना दोन सुंदर गणेशस्थाने बघावीत अशी आहेत. त्यांचे स्थान, त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा आणि त्या ठिकाणाचे नैसर्गिक महत्त्व यासाठी ही दोन ठिकाणे मुद्दाम वाट वाकडी करून बघावीत.
इच्छापूर्ती गणेश- एरंडोल आजरा
कोल्हापूर जिह्यातला आजरा तालुका निसर्गसौंदर्याने नटलेला आणि बहरलेला आहे.
हा सगळा प्रदेश खरं तर दुर्गम म्हणायला हवा. अतिशय रमणीय आणि गूढ असलेल्या
ह्या आडवाटेवरच्या प्रदेशात एक गणेशस्थान आहे एरंडोल इथे. हे
गणेशस्थानसुद्धा काहीसे गूढ म्हणावे लागेल. ही मूर्ती एरंडोल आजरा इथे
पोखरकर महाराजांच्या आश्रमात असलेल्या अष्टकोनी मंदिरामध्ये स्थापित केलेली
आहे. आश्रमात एक विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आणि जाबाली ऋषींची समाधीसुद्धा
आहे. भक्तांनी केलेल्या आर्थिक मदतीमधून हे मंदिर बांधलेले आहे. या
मंदिराला तळघर असून ध्यानधारणेसाठी तिथे बसता येते. अष्टविनायकांच्या
प्रतिमा आठ दिशांना या मंदिरात ठेवलेल्या आढळतात. गर्भगृहात सोळा हात
असलेली, उजव्या सोंडेची, पंचधातूची ही मूर्ती उभ्या स्थितीतली आहे.
मूर्तीचे सोवळे अत्यंत कडक असून पुजारी सोडून कोणालाही गर्भगृहात प्रवेश
करता येत नाही. ही मूर्ती इथे कशी आली याबद्दल एक चमत्कारिक कथा प्रसिद्ध
आहे. तांत्रिक साधना करणाऱया लोकांच्या वापरातली ही मूर्ती होती. चंबळ
इथल्या एका ऋषींच्या जवळ असलेली ही मूर्ती चंबळ-उज्जैन-तंजावर-गोकाक असा
प्रवास करत शेवटी संकेश्वर इथल्या रघुनाथशास्त्राr नामक महात्म्याकडे आली.
रघुनाथ शास्त्राr आजारी पडल्यावर ही मूर्ती एरंडोल आजरा इथले संत तुळशीराम
महाराज पोखरकर यांना द्यावी असा त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. त्यायोगे ही
मूर्ती एरंडोल इथे येऊन पोहोचली. मूर्तीचे तेज आणि तिची शक्ती सहन न
झाल्याने तिचा सुरुवातीला पोखरकर महाराजांना बराच त्रास झाला. परंतु
त्यांचे गुरु काशी येथील आत्मप्रकाशानंद यांनी स्वामींना आश्वस्त केले आणि
त्याचा त्रास बंद झाला. पुढे पोखरकर महाराजांच्या आश्रमातच हे मंदिर बांधून
तिथे मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी प्रसाद म्हणून नारळ फोडला जात नाही तर
गूळखोबरे आणि शेंगदाण्याचे लाडू देवापुढे ठेवले जातात. अनेक भाविकांची
इच्छा पूर्ण करणारा म्हणून याला इच्छापूर्ती गणेश म्हणतात, तर साधकांना मदत
करणारा म्हणून याला मोक्षदाता गणेश असेही नाव आहे. दर संकष्टीला कर्नाटक,
गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाविक दर्शनासाठी इथे येतात.
इंचनालचा गणेश
कोल्हापूर जिह्यातला गडहिंग्लज हा तालुका म्हणजे अनेक निसर्गरम्य ठिकाणे,
किल्ले, मंदिरे यांची रेलचेल असलेला प्रदेश आहे. खरं तर हा काहीसा
दुर्लक्षित भाग म्हणावा लागेल. पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध असूनही या
प्रदेशांबद्दल फारशी माहिती लोकांना नसते. भौगोलिकदृष्टय़ा सुद्धा हा प्रदेश
काहीसा वेगळा पडल्यासारखाच आहे. आंबोलीसारखे प्रसिद्ध गिरीस्थान इथून जवळ
आहे. गर्द झाडी, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि चंदगड, आजरा यासारखे
निसर्गसंपन्न तालुके यांचा शेजार लाभलेला हा भाग. गडहिंग्लजच्या पश्चिमेला
फक्त 7 कि.मी. अंतरावर इंचनाल नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य
लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर या
ठिकाणी गणेशाचे एक सुंदर मंदिर उभे आहे. या मंदिराला बराच इतिहास लाभलेला
आहे. इ.स. 1907-08 साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार श्री. गोपाळ
आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ
सेवा मंडळ, इंचनाळ, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून 1987 ते 1992
या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले. त्यासाठी गोकाकवरून
आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते 4
मे 1992 रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप,
बाजूला बगिचा, महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे हा. इंचनालच्या या
मंदिरातील गणेशमूर्ती बैठी असून तिची उंची अंदाजे सवा दोन फूट एवढी आहे.
काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते. चतुर्भुज
गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे. या
मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावानी जवळ जवळ 9 एकर
बागायती जमीन आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱया गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव
करतात आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा,
बेळगाव इथून भाविक यावेळी इथे दर्शनाला येतात. अत्यंत जागृत आणि नवसाला
पावणारे अशी ख्याती असलेले हे देवस्थान आहे. महागावचे दंडगे (जोशी)
घराण्याकडे गेल्या 300 वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली
आहे. कोल्हापूर-गडहिंग्लज येण्यासाठी बस सेवा विपुल आहे. मुद्दाम वाट वाकडी
करून पर्यटकांनी हा सगळाच परिसर फिरून पाहण्याजोगा आहे.
ashutosh.treks@gmail.com
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)
गणेशोत्सव, विनायकी पूजन आणि सामाजिक समतेचा तांत्रिक वारसा
गणेश चतुर्थीचा सण आपण सामाजिक एकतेचा उत्सव म्हणून साजरा करतो. परंतु शाक्त तंत्र परंपरेत गणपतीच्या स्त्री रूपाची, म्हणजेच विनायकीची पूजा केली जात होती, हे अनेकांना माहीत नसते. ही परंपरा सामाजिक समता आणि स्त्री-पुरुष एकतेचा संदेश देणारी होती. मात्र, कालांतराने सनातनी विचारसरणीमुळे ती मागे पडली.
विनायकी: शक्तीस्वरूप गणेश
शाक्त तंत्रातील ग्रंथ, जसे कुलार्णव तंत्र आणि तंत्रसार, गणपतीच्या स्त्री रूपाला विनायकी किंवा गणेशी म्हणतात. गजमुखी आणि चतुर्भुज असलेली विनायकी सर्जनशीलता आणि शक्तीचे प्रतीक आहे. तांत्रिक साधनेत तिची पूजा प्रारंभी केली जाते, ज्यामुळे साधकाला बाह्य आणि आंतरिक अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. ही पूजा पुरुष (चैतन्य) व स्त्री (ऊर्जा) यामध्ये स्त्री शक्तीला केंद्रस्थानी ठेवते आणि शिव-शक्तीच्या एकत्वावर आधारित आहे.
प्रख्यात विचारवंत आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील यांनी भारतीय संस्कृतीतील अब्राह्मणी परंपरांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मते, कुलार्णव तंत्रातील कौलाचार जाती-वर्ण व्यवस्थेला आव्हान देणारा होता. विनायकी पूजनासारख्या प्रथा स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत होत्या. कॉम्रेड शरद पाटील यांनी तंत्र परंपरेला सामाजिक समता आणि जातीअंताच्या दृष्टिकोनातून विश्लेषित केले. डॉ. अशोक राणा यांनीही आपल्या मातृदेवतांच्या संदर्भातील लेखनात तंत्र परंपरांमधील विनायकी देवतेचा इतिहास मांडला आहे.
तंत्रातील पूजा पद्धतींनी सर्वांना समान संधी दिली आणि सामाजिक भेदभावांना विरोध केला.
सनातनी विचारांचा प्रभाव आणि तंत्राचा ऱ्हास
मध्ययुगात आणि त्यानंतरच्या काळात सनातनी विचारसरणीने तंत्र परंपरांना बाजूला सारले. कौलाचार आणि विनायकी पूजनासारख्या अब्राह्मणी प्रथांना अशुद्ध किंवा गूढ ठरवून त्यांचा प्रभाव कमी करण्यात आला. यामागील कारणे खालीलप्रमाणे:
1. सनातनी विचारांनी वर्ण-जातीच्या कठोर नियमांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे तंत्रातील समतावादी दृष्टिकोनाला विरोध झाला.
2. तंत्रातील स्त्री-केंद्रित पूजा, जसे विनायकी किंवा काली, यांना पुरुषप्रधान व्यवस्थेने दाबले.
3. तंत्रातील पंचमकारांचा प्रतीकात्मक अर्थ बाजूला ठेवून त्यांना अश्लील ठरवले गेले.
4. राजेशाही आणि वसाहतवादी काळात तंत्र परंपरांना अंधश्रद्धा आणि अघोरी गूढ ठरवून त्यांचे दमन झाले, ज्यामुळे सनातनी विचारांना अधिक बळ मिळाले.
यामुळे विनायकीसारख्या पूजा प्रथा जवळपास लुप्त झाल्या. आज गणेशोत्सवात आपण गणपतीची पुरुष रूपातच पूजा करतो, आणि विनायकीचा वारसा विसरला गेला आहे.
गणेशोत्सव हा धार्मिक सणाबरोबरच सामाजिक एकतेचा उत्सव आहे. खरी भक्ती जाती, वर्ण आणि लिंगाच्या पलीकडे जाते. कॉम्रेड शरद पाटील यांनी शाक्त पंथाबद्दल मांडणी करताना त्याचा मार्क्सवाद, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांशी मेळ घालणारा दृष्टिकोन भारतीय संस्कृतीतील समतेची ताकद दाखवतो.
*समर्थ गणेश (अर्थात रामदास स्वामींनी त्यांच्या समर्थ शब्दांत वर्णिलेला गणपती)*
- दादासाहेब दापोलीकर
आपल्या संस्कृतीमध्ये 'सगळे देव सारखे' असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. परंतु तरीही काही देवांचा प्रभाव जनमनावर इतर देवांपेक्षा अधिक आहे. असे का? याला उत्तर नाही. आमचे विष्णु भगवान भक्तांना तारण्यासाठी अनेक अवतार घेऊन पृथ्वीवर येतात. आमचा कैलास राणा संहारक शिव तर दुष्टांचा, शत्रूचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आमची युद्धगर्जनाच मुळी 'हर हर महादेव' अशी आहे! हिंदुस्थानमध्ये जर कुठल्या एका देवाची सर्वाधिक मंदिरे असतील तर ती या महादेवांची! त्या खालोखाल बहुधा मारुतीची देवळी असावीत! ब्रह्मदेव तर सर्वात ज्येष्ठ देव! आणि इंद्र महाराज तर देवाधिराज! हे सर्व देव आपापल्या ठिकाणी महान आहेत. प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. परंतु जर कुठल्या एका देवाचा दहा दहा दिवस उत्सव साजरा होत असेल तर तो म्हणजे विघ्नहर्ता, सुखकर्ता गणपती! गणपतीने लोकांच्या मनावर इतकं गारुड केलं आहे की एकेकाळी फक्त महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा हा गणेशोत्सव आता हिंदुस्थानच्या अनेक राज्यांमध्ये प्रसिद्ध होत चालला आहे. गणपती हा विघ्ननाशक तसेच विद्येचा अधिपती आहे. संकटापासून मुक्ती आणि विद्यार्जन या दोन्ही गोष्टी प्रत्येकाला हव्या असतात. कदाचित त्यामुळेच ही देवता भक्तमंडळींमध्ये अधिक सुप्रसिद्ध असावी. गणपतीचे दुसरे वैशिष्ट्य असे की गणपती हा 'डिझायनर्स गाॅड' आहे! अनेक पद्धतीने गणपतीचे चित्र किंवा शिल्प निर्माण करता येते! पट्टीचा चित्रकार नसलेला मनुष्यसुद्धा गणपतीचे रेखाचित्र सहज काढू शकतो!
हिंदुस्थानमध्येच नव्हे तर जगामध्ये अनेक ठिकाणी गणपतीची मंदिरे आणि मूर्त्या आहेत. आणि प्रत्येक मूर्ती वेगळी! प्रत्येक चित्र वेगळे! या भगवंताच्या रूपामध्ये जेवढे वैविध्य आहे तेवढे दुसऱ्या कुठल्याही देवाच्या रूपामध्ये नाही! ज्याला जशी कल्पना सुचेल तसा त्याने गणपती रेखाटावा! कसलेही बंधन नाही! कसलाही नियम नाही. लोकांच्या कल्पनाविलासाला वाव देणारा असा हा कलांचा अधिपती! गणपती जसा चित्रकारांना, शिल्पकारांना भावतो तसाच तो लेखक आणि कवींनाही साद घालतो! मराठीमध्ये गणपतीवर जेवढी गीते आणि आरत्या लिहिल्या गेल्या आहेत तेवढ्या दुसऱ्या कोणत्याही देवावर लिहिल्या गेल्या नसाव्यात!
साधुसंतही या गणेशाकर्षणाला अपवाद नाहीत! माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रारंभाचे गणेश स्तवन करताना, "ओम नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।" अशा प्रासादिक आणि श्रीमंत शब्दांमध्ये गणरायांचं वर्णन केलं आहे. माऊलींचे गणेश स्तवन हा वेगळ्या लेखाचा एक विषय होईल. आज आपण दासबोधामधील समर्थांच्या गणेश स्तवनाची चर्चा करणार आहोत.
रामदास स्वामींची शब्द श्रीमंती इतकी अफाट आहे की काही विचारू नका! आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती जो गणपती, त्याचे, कुठल्याही शुभकार्यारंभी वंदन करतात. त्यानुसार समर्थांनी ग्रंथराज दासबोधाची रचना करताना गणपतीचं जे काही अलौकिक वर्णन केलं आहे त्याला मराठी वाङ्मयामध्ये तुलना नाही! या स्तवनांच्या दशकामध्ये ग्रंथारंभ लक्षणांचा पहिला समास संपला की दुसऱ्या समासामध्ये समर्थांनी गणनायकाला नुसतं वंदनच केलं आहे असं नव्हे तर त्यांच्या खास रामदासी शैलीमध्ये या देवतेचं वर्णन केलं आहे. रामदास स्वामींची भाषा ही नेहमीच केवळ भक्तीरसपूर्ण नव्हे तर शक्तीरस म्हणजे वीररसपूर्ण राहिली आहे. भक्तीबरोबरच बलोपासनेचे महत्त्व जर कुठल्या एका संताने महाराष्ट्राला सांगितले असेल तर ते म्हणजे रामदास स्वामींनी. गणेशस्तवनाच्या या समासामध्ये रामदास स्वामींचे हे वीररसपूर्ण शब्द आपल्याला संमोहित करतात. पहिल्याच ओवीमध्ये समर्थ म्हणतात,
ओम नमोजी गणनायका । सर्व सिद्धी फळदायका ।
अज्ञानभ्रांतीछेदका। बोधरूपा। । १।।
'सर्व सिद्धी फळदायक' म्हणतानाच रामदास स्वामी त्याला अज्ञान आणि भ्रम यांचा छेद म्हणजे नाश करणारा असं म्हणतात.
तिसऱ्या ओवीमध्ये स्वामी लिहितात-
तुझिये कृपेचेनि बळे । वितुळती भ्रांतीची पडळे ।
आणी विश्वभक्षके काळे । दास्यत्व कीजे ।।३।।
हे गजानना, तुझ्या कृपेने भ्रमाचे म्हणजे अज्ञानाचे ढग वितळून जातात आणि सर्वभक्षी असा जो काळ तोही दास्यत्व करू लागतो.
येतां कृपेची निज उडी। विघ्ने कांपती बापुडी।
होऊन जाती देशोधडी। नाममात्रे ।।४।।
तुझ्या कृपेच्या नुसत्या उडीने सारी संकटे चळचळा कापू लागतात आणि अक्षरशः देशोधडीस लागतात!
या तीन ओव्यांमधील छेदक, वितळणे, भक्षक, उडी मारणे, विघ्नांचे भीतीने कापणे अशी सारी वीररसपूर्ण शब्दसंपदा समर्थांनी हेतू पुरस्सर, वीर रसाचा पुरस्कार करण्यासाठी वापरली आहे हे निश्चित. गणपती ही केवळ विद्येची देवता आहे असे नव्हे तर तो विघ्ननाशक आहे. विघ्नांचा, शत्रूंचा नाश करण्यासाठी त्याच्याकडे त्याची स्वतःची बलशाली सोंड आहे, पाश आहे, परशु आहे! एरवी अत्यंत सात्विक, राजस आणि साजिरे दिसणारे गणरायाचे हे रूप प्रसंग आला तर महासंहारक होऊ शकते. मध्ययुगामध्ये गणेशाची उपासना, लोकांनी विद्येची देवता यापेक्षा, किंवा कमीत कमी त्याबरोबरच, शौर्याची देवता म्हणून करावी असे समर्थांच्या मनात असावे हे पुढील श्लोकावरून लक्षात येते.
म्हणोनी नामे विघ्नहर । आम्हा अनाथांचे माहेर।
आदिकरूनी हरिहर। अमर वंदिती ।।५।।
कुठे सहसा वाचण्यात किंवा ऐकण्यात न येणारी अशी एक त्या काळाला अनुरूप गोष्ट समर्थ गणपती संदर्भात लिहितात. ते गणेशाला 'अनाथांचे माहेर' म्हणत आहेत. यावनी आक्रमणांनी, अत्याचारांनी गांजलेल्या अनाथ जनतेला गणेशाचा आधार कसा वाटतो? तर त्यांना ते आपले माहेर वाटते! त्याकाळी किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत होत असलेल्या सासुरवासाला कंटाळलेल्या स्त्रीला माहेरचा जसा आधार वाटतो तसाच आधार लोकांना गणेशाचा वाटतो. अशी एक सुंदर संकल्पना रामदास स्वामींनी येथे मांडली आहे...
त्यानंतर स्वामींनी गणेशाच्या रूपाचं जे काही अद्वितीय वर्णन केले आहे ते त्यांच्या शब्दात ऐकलेलं बरं.
जयाचे आठविता ध्यान । वाटे परम समाधान ।
नेत्री रिघोनिया मन । पांगुळे सर्वांगी।। ६ ।।
तुझे रूप आठवले की इतकं समाधान होतं की, मन केवळ सर्व शरिरातून निघून नयनांमध्ये येऊन बसतं! सर्व शक्ती नेत्रांठायी एकवटल्यामुळे इतर शरीर जवळजवळ पांगळं होतं!
सगुण रुपाची ठेव । महा लावण्य लाघव ।
नृत्य करिता सकळ देव । तटस्थ होती।।७।।
तुझे सगुण रूप म्हणजे मूर्तस्वरूप इतके सुंदर आहे, तुझे नृत्य इतके लाघवी आहे की सारे देव मंत्रमुग्ध होतात!
गणपतीच्या रूपाची इतकी भरभरून प्रशंसा करणारे समर्थ हे बहुधा एकमेव!
सर्वकाळ मदोन्मत्त। सदा आनंदे डुल्लत।
हरुषें निर्भर मुदित । सुप्रसन्न वदनु।। ८।।
वास्तविक पाहता, मानवी शरिरावर हत्तीचे मस्तक जोडून जन्मास आलेले गणराज, मानवी सौंदर्याच्या व्याख्येमध्ये कुठे बसतात हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. रामदास स्वामींना मात्र सदा सर्वकाळ गजराजाप्रमाणे मदोन्मत असलेला, हत्तीसारखाच आनंदाने डोलत असलेला भगवान गजानन याचे वदन हे अत्यंत सुप्रसन्न भासते! हे वदन जरी सुप्रसन्न असले तरी ते कसे भव्य दिव्य आहे ते पुढील ओवीमध्ये समर्थ अत्यंत सुयोग्य शब्दामध्ये वर्णितात.
भव्यरूप वितंड। भीममूर्ति माहा प्रचंड।
विस्तीर्ण मस्तकीं उदंड। सिंधूर चर्चिला । । १०।।
हे गणपती, तुझे गजरूप हे भव्यदिव्य, भीमकाय आणि महाप्रचंड आहे! हत्तीच्या त्या विशाल भालप्रदेशावर भरपूर शेंदूर चर्चिलेला आहे.
नाना सुगंध परिमळें। थबथबा गळती गंडस्थळें ।
तेथें आलीं षट्पदकुळें। झुंकारशब्दें ।। ११। ।
एखादी गोष्ट किंवा क्रिया कशी आहे हे वाचकांना सहजच कळावे म्हणून समर्थ अतिशय समर्पक शब्द वापरतात. गणपतीचे गंडस्थळ कसे गळत आहे तर 'थबथबा' गळत आहे! एखाद्या मधाच्या पोळ्यातून अत्यंत मधुर असा मध ठिबकत राहावा तसा गणपतीच्या गंडस्थळामधून सुगंधित असा तो मद पाझरत आहे. त्याच्या सुवासाने मधमाशा आणि भुंगे गुंजारव करत तेथे आलेले आहेत.
मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्षणा मंदसत्वी । । १२। ।
तुझी कधी वक्राकृती तर कधी सरळ अशी सतत हलत असलेली सोंड अत्यंत विलोभनीय दिसते. तुझे अनोखे गंडस्थळ आणि थोडासा लांब आणि खालच्या बाजूला निमुळता होत गेलेला असा तुझा (सोंडे)खालचा ओठ यांतून मंद मंद रित्या मदस्त्राव होत आहे.
समर्थांचे निरीक्षण किती सूक्ष्म होते याचा, या दोन ओळी म्हणजे उत्तम नमुना आहे. काही ठिकाणी या ओवीचे थोडे वेगळे अर्थ दिले आहेत. एके ठिकाणी म्हटले आहे की, "तुझी वक्राकार सोंड सरळ झाली की शोभून दिसते. गंडस्थळ आणि खालचा ओठ हे शोभायामान दिसत आहेत. गंडस्थळामधून तीक्ष्ण मदस्त्राव सतत ठिबकत असतो." आमच्या मते हे असे नाही. गंडस्थळ म्हणजे सोंडेच्या प्रारंभापासून ते वरच्या बाजूला, डोळ्यांच्या वरती आणि पुढे माहुत जेथे अंकुश टोचतो तेथपर्यंतचा भाग. हत्ती जेव्हा मदोन्मत्त होतो तेव्हा या गंडस्थळामधून जो मद स्रवतो तो दोन्ही बाजूने खाली ओघळून जमिनीवर पडत राहतो आणि काही थोडा मद हत्तीच्या खालच्या ओठापर्यंत जातो आणि तेथून त्या निमुळत्या (तीक्ष्ण)ओठातूनही त्याचे थेंब थेंब खाली पडत राहतात.
चौदा विद्यांचा गोसांवी। हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ||१३||
चौदा विद्यांचा अधिपती असा तू! तुझे डोळे किती बरे इवले आहेत आणि ते तू सतत हलवत आहेस! तुझ्या कानांच्या अत्यंत पातळ असलेल्या पाळ्या फड-फड असा आवाज करत, तू सतत हलवत आहेस.
इथे जिज्ञासू मंडळींना असा प्रश्न पडेल की रामदास स्वामींनी पुढच्या तीन ओळींमध्ये गणपतीच्या अवयवांचे आणि हालचालींचे वर्णन केले आहे. परंतु पहिल्या ओळीमध्ये 'चौदा विद्यांचा गोसावी' म्हणजेच स्वामी असे लिहिले आहे. वरवर पाहता पहिली ओळ आणि पुढच्या तीन ओळी यांचा तसा अर्थार्थी संबंध दिसत नाही. परंतु रामदास स्वामींनी हे काही नुसतेच यमक जुळावे म्हणून लिहिलेले नसणार. या दोन गोष्टी एकत्रित लिहिण्यामागे त्यांची काहीतरी विचार भूमिका असली पाहिजे.
'डोळे आणि कान ही पंचेंद्रियांपैकी दोन महत्त्वाची ज्ञानेन्द्रिये आहेत. त्यांचा सतत वापर करून आपल्या सभोवती असलेल्या परिस्थितीमधून जे काही ज्ञान आत्मसात करता येईल ते सतत करत राहावे.' असा संदेश तर समर्थांना या ओवीमधून द्यायचा नसेल?
रत्नखचित मुगुटीं झळाळ। नाना सुरंग फांकती कीळ ।
कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ।। १४।।
या ओवीमध्ये समर्थांनी गणपतीच्या अलंकारांचे वर्णन केले आहे. रत्नजडित असा झळाळणारा मुकुट केवळ अवर्णनीय! त्यामधील रत्नांमधून विविध रंगांचे अत्यंत सुंदर आणि तेजस्वी असा प्रकाश बाहेर पडत आहेत. ज्यांच्यावर अत्यंत तेजस्वी अशी नील रत्ने जडवली आहेत असे कुंडल कानामध्ये तळपत आहेत.
वरवर पाहता हे अलंकारांचे वर्णन असले तरी समर्थांना येथे अभिप्रेत आहे तो ज्ञानाचा प्रकाश! या आधीच्या ओवीमध्ये आपल्या ज्ञानेन्द्रियांद्वारे ज्ञानार्जन केले की आपण समृद्ध होतो आणि त्या ज्ञानाचा प्रकाश इतरत्र पसरतो. ज्ञानाचा आणि मस्तिष्काचा संबंध आहे. म्हणून स्वामींनी शिरावर धारण केल्या जाणाऱ्या अलंकारांचे रूपक येथे वापरले आहे.
दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट ।
तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ।। १५।।
तुझे पांढरे शुभ्र दात घट्ट म्हणजे मजबूत आहेत! त्यावरती सुवर्णाची रत्नखचित कडी बसवलेली आहेत. या सोन्याच्या कड्यांखाली छोटी छोटी सोन्याची पाने लावलेली आहेत आणि ती रत्नप्रकाशात तळपत आहेत.
समर्थांनी गणपतीचे वर्णन करताना शिरापासून सुरुवात केली आहे आणि ते हळूहळू शरीराच्या अधोभागांकडे वर्णन करीत येत आहेत. गणपती म्हटले की दातांचे वर्णन हवेच! गणपती हा चौदा विद्यांचा अधिपती आहे. एकदा ज्ञान अर्जित करून झाले की ते दानसुद्धा केले पाहिजे. सर्वाधिक ज्ञानदान हे मुखावाटे होते. वाणीच्या सिद्धतेमध्ये दातांचे मोठे योगदान आहे. म्हणून दातांची म्हणजेच पर्यायाने ज्ञानदानाची श्रीमंती समर्थांनी सुवर्णालंकारांच्या रूपकाने येथे विशद केली आहे.
लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद ।
क्षुद्र घंटिका मंद मंद| वाजती झणत्कारें ।। १६। ।
चतुर्भुज लंबोदर। कासे कासिला पितांबर ।
फडके दोंदिचा फणिवर| धुधूकार टाकी ।।१७। ।
डोलवी मस्तक जिव्हा लाळी। घालून बैसला वेटाळी।
उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे । । १८ ।।
हे लंबोदरा, तुझे पोट हे थुलथुलीत असून ते हलत आहे. कमरेला कमरपट्ट्याच्या ऐवजी साक्षात नागराज वेढा घालून बसलेले आहेत! (कमरेत बांधलेल्या) छोट्या छोट्या घंटिका किणकिण असा मंजुळ आवाज करत आहेत. .
या दोन्ही ओव्यांचे अनेक ग्रंथांमध्ये केवळ शब्दावर आधारित असे अर्थ विशद केलेले आहेत. आमच्या मते समर्थांना या गणपतीवर्णनाद्वारे शब्दांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळे तत्त्वज्ञान अपेक्षित आहे.
पितांबर धारण केलेला चतुर्भुज लंबोदर गजानन! त्याच्या उदरावर कमरेला वेढून बसलेला सर्पराज फूत्कार टाकत आहे!
त्याच्या चार भुजा जणू चार पुरुषार्थांचे प्रतीक आहेत. समर्थांनी पितांबरासाठी पिवळा रंग हा मुद्दामहून योजिला आहे. पीत वर्ण हा सूर्याचे म्हणजे तेजाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे पिवळा रंग हा आनंद ,आशावाद, ऊर्जा आणि बुद्धीचेही प्रतीक आहे. गणपतीचे मोठे पोट हे ऐश्वर्याचे आणि समृद्धीचे लक्षण आहे. त्याचबरोबर ते प्रापंचिक गुंतागुंतीचे प्रतीक आहे. ऐश्वर्य, समृद्धी, संसार या सगळ्या गोष्टी कितीही चांगल्या भासल्या तरी काळरुपी सर्प त्यांना वेढून बसलेला आहे आणि एक दिवस तो या सर्व ऐहिक गोष्टींना गिळून टाकणार आहे. त्यामुळे त्यामध्ये अधिक अडकू नका हा संदेश त्यातून आपल्याला मिळतो.
या सर्पाचे अत्यंत भीतीदायक असे वर्णन समर्थांनी केले आहे. वेटोळे घालून बसलेला हा काळरुपी सर्प नेमका नाभीजवळ म्हणजे उद्गगमबिंदूजवळच फणा काढून बसला आहे! जिभल्या चाटत, मस्तक डोलवत आजूबाजूला टकमक पाहत आहे. काळ आपल्यावर लक्ष ठेवून आहे. त्याने आपल्याला वेढलेले आहे आणि तो आपल्याला कधी मटकावून टाकेल त्याचा काहीही भरोसा नाही.
नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां ।
रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे । । १९ ।।
शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ ।
येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति । । २०। ।
गणपतीच्या गळ्यामध्ये ज्या विविध प्रकारच्या पुष्पमाळा रुळत आहेत त्या कमरेमधील सापापर्यंत पोहोचतील इतक्या लांब आहेत. रत्नजडित हारामधील, केंद्रस्थानी असलेले पदक हृदयाजवळ आले आहे आणि ते अत्यंत विलोभनीय दिसत आहे
एका हातातील परशु हे युद्ध सिद्धतेचे प्रतीक तर दुसऱ्या हातातील कमळ हे शांतीचे प्रतीक! तिसऱ्या हातात असलेला अंकुश हा दुर्जनांवर सज्जनांचे प्राबल्य, अज्ञानावर ज्ञानाचे प्रभुत्व यांचे प्रतीक तर चौथ्या हाताने मोदक हे सौख्य, भरभराट, विपुलतेचे प्रतीक!
नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी| उपांग हुंकारे ।। २१ ।।
स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण।
साजिरी मूर्ति सुलक्षण। लावण्यखाणी ।। २२।।
गणपती विद्येचा जसा अधिपती आहे तसा चौसष्ट कलांचाही अधिपती आहे. तो स्वतः एक श्रेष्ठ नट आहे आणि नर्तकही! टाळ मृदंगाच्या तालावर तो विविध प्रकारचे नृत्य करू शकतो. सतराव्या - अठराव्या शतकापर्यंत यवनांनी जो धुमाकूळ घातला होता त्याने सर्वसामान्य रयतेच्या जीवनाचे पार वाटोळे करून सोडले होते. प्राण, मालमत्ता वाचवण्याचीच मारामारी, तर कला आणि विद्या कशा शिकायच्या? तर त्यासाठी गणपतीची उपासना आवश्यक आहे हे लोकांना कळावे. म्हणून समर्थ प्रयत्नरत असायचे. गणपती जसा विविध संकटांना तोंड देतानाच विद्या आणि कलांचा उपासक बनला त्याप्रमाणेच लोकांनीही विद्या आणि कला आत्मसात कराव्यात हा यामागचा हेतू!
गणपतीचे पोट मोठे, त्याचे शीर हत्तीचे. त्यामुळे हा देव सुस्त वगैरे असावा असे कुणाला वाटू शकते. समर्थ या तार्किक शक्यतेचे निराकरण करताना सांगतात की, गणपतीला एकाही क्षणाची स्थिरता मंजूर नसते! त्याच्या सतत हालचाली सुरू असतात. चपळतेमध्ये तर तो सर्वात पुढे आहे. त्याचे रुपडेसुद्धा अत्यंत साजिरे आहे! जणू काही लावण्याची खाणीच!!
रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी । । २३ ।।
गणपतीच्या पायातली नुपुरे तो हालचाल करीत असताना, चालत असताना किंवा नर्तन करीत असताना रुणझुण रुणझुण अशी मंजुळपणे वाजत आहेत. दंडातल्या वाक्याही मधुर ध्वनी करत आहेत. आणि दोन्ही पायात असलेल्या घागऱ्यासुद्धा किणकिणत आहेत. या घागऱ्यांमुळे गजवदनाची दोन्ही पावले सुद्धा अत्यंत मनोहर दिसत आहेत!
गणपतीचे व्यक्तिमत्व जसे प्रभावी आणि सामर्थ्यवान आहे त्याच्या हातामध्ये असलेल्या शस्त्र, पुष्प, खाद्य इत्यादी वस्तू ज्याप्रमाणे त्याच्या हेतूचे आकलन करत असतात, त्याचप्रमाणे त्याच्या शरीरावरील अलंकारही त्याच्या कलासक्ततेबद्दल आपल्याला अवगत करतात!
ईश्वरसभेसी आली शोभा। दिव्यांबरांची फांकली प्रभा।
साहित्यविशईं सुल्लभा। अष्टनायका होती ।। २४।।
गणपतीच्या उपस्थितीमुळे देवसभेससुद्धा म्हणजे शंकराच्या सभेस शोभा आलेली आहे! त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा तर काही अफाटच! गणपतीच्या कृपेमुळे तेथील अष्टनायिका साहित्य, कला, नृत्य आदि विषयात प्रवीण झालेल्या आहेत. (काही ठिकाणी याचा अर्थ असा दिला आहे की गणपतीला सर्व प्रकारचे साहित्य सिद्ध करून देण्यासाठी अष्टनायिका तयार आहेत. परंतु हा तितकासा योग्य वाटत नाही. अष्टनायिकांचा संबंध, साहित्य, कला, नृत्य इत्यादीशी येतो. त्यामुळे या अष्टनायिका गणपतीला शंकराच्या दरबारात कुठलं साहित्य सिद्ध करून देत असतील असे वाटत नाही. तसेच काही ठिकाणी अष्टनायिका गणपतीला साहित्य निर्मितीसाठी मदत करतात असेही लिहिले आहे. तेही सयुक्तिक वाटत नाही.)
ऐसा सर्वांगे सुंदरु। सकळ विद्यांचा आगरु ।
त्यासी माझा नमस्कारु। साष्टांग भावें ।। २५।।
ध्यान गणेशाचें वर्णितां। मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां। वोळे सरस्वती ।।२६।।
तर अशा या सर्वांग सुंदर आणि सर्व विद्यांचे निधान असलेल्या गणपतीला माझा साष्टांग नमस्कार.
गणपतीची महती इतकी मोठी आहे की त्याचे वर्णन ज्ञानपूर्वक ऐकले तर एखाद्या मतीभ्रष्टाला, वेड्याला सुद्धा बुद्धी प्राप्त होईल, त्याच्या डोक्यात बुद्धीचा प्रकाश पडेल. गजाननाचे गुणवर्णन ऐकून प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होईल.
जयासि ब्रह्मादिक वंदिती। तेथें मानव बापुडे किती।
असो प्राणी मंदमती। तेहीं गणेश चिंतावा ।। २७।।
ज्या दैवताला प्रत्यक्ष ब्रम्हदेवादि देव वंदन करतात, तेथे मनुष्याची बापड्याची काय स्थिती? असो. ज्यांची बुद्धी मंद आहे, जे अल्पमती आहेत त्यांनीही गणेशाचे चिंतन केल्यामुळे त्यांना लाभ होईल.
जे मूर्ख अवलक्षण। जे कां हीणाहूनि हीण।
तेचि होती दक्ष प्रविण। सर्वविशईं ।। २८।।
जे अत्यंत मूर्ख आहेत, अनेक विषयांमध्ये ज्यांना विशेष गती नाही एवढेच नव्हे तर जे त्या त्या विषयांमध्ये ज्ञानाच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवर आहेत ते सर्वजण गणेश आराधना करून या सर्व विषयांमध्ये अत्यंत प्रवीण होतील.
ऐसा जो परम समर्थ। पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजनस्वार्थ। कलौ चंडीविनायकौ ।। २९।।
असा हा गणराज अत्यंत सामर्थ्यशाली आहे. त्याच्या भजनी लागणाऱ्यांचे, त्याची भक्ती करणाऱ्यांचे सारे मनोरथ तो पूर्ण करतो हे प्रचितीसह सांगता येईल. 'कलौ चंडी विनायकौ!' हे वचन तर प्रसिद्धच आहे. याचा अर्थ कलियुगामध्ये चंडी आणि विनायक ही दोन दैवते जागृत आहेत. त्यांच्या भजनी लागून त्यांची भक्ती करणे हे भक्तांना हितप्रद आहे ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे.
ऐसा गणेश मंगळमूर्ती। तो म्यां स्तविला यथामति ।
वांछा धरूनि चित्तीं । परमार्थाची ।। ३०।।
तर अशा या मंगलमूर्ती गणेशाचे, परमार्थ हेतूने मी माझ्या बुद्धीप्रमाणे स्तवन केले आहे!
गणेश स्तवन हे परमार्थ हेतूने केले आहे असे समर्थांनी म्हटले आहे. याचाच अर्थ 'हे गणेशस्तवन केवळ एखाद्या शुभकार्याच्या आरंभी करायचे असते' केवळ म्हणून केलेले नसून या स्तवनाच्या ओव्यांमधूनही लोकांनी काहीतरी बोध घ्यावा असेच रामदास स्वामींच्या मनात असणार आहे.
'सुखकर्ता दु:खहर्ता' या रामदास स्वामींनी रचलेल्या गणपतीच्या अप्रतिम आरतीला जसा अग्र-आरतीचा मान 'स्वयमेवमृगेंद्रता' या न्यायाने मिळाला आहे, त्याचप्रमाणे दासबोधातील या गणेश स्तवनाला अग्र-स्तवन म्हणणे उचितच ठरेल!
दादासाहेब दापोलीकर
९९६७८४०००५
विनायक ते गणेश…
गणपती ही बुद्धीची देवता. गणपती हा विघ्नहर्ता. गणपती म्हटलं म्हणजे डोळ्या समोर येतो व्यासांनी दिलेली कामगिरी पार पाडणारा कुशल लेखणीक. कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणेशपूजन केल्याशिवाय कार्य निर्विघ्न पार पडत नाही म्हणून गणपती हा विघ्नहर्ता. गणपतीला महाराष्ट्रामध्ये आज सर्वात अधिक पूजल्या जाणाऱ्या दैवतां मध्ये गणलं जातं. अश्या या गणेशाची प्राचीनता ग्रांथीक आधारावर काय सिद्ध करते ते पाहू…
ऋग्वेदात गणपतीचा तथाकथित उल्लेख पुढीलप्रमाणे येतो –
गणानाम् त्वा गणपतिं हवामहे, कविं कवीनामुपश्रवस्तम्,
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: शृण्वन्न्तिभिं: सीद सादनम् ।
( हे ब्रह्मणस्पते, तू गणांचा अधिपती आहेस. कविंचा कवी आहेस, तुझ्याजवळ विपुल अन्न आहे, तू ज्येष्ठ आहेस. यज्ञस्थळी येऊन आसनस्थ हो असे आम्ही तुला आवाहन करतो.)
वरील ऋचेमध्ये ब्रह्मणस्पतीला गणांचा अधिपती म्हणजे प्रमुख अर्थात गणपती असे संबोधले आहे ब्रम्हणस्पती म्हणजे आजचा गणपती नव्हे. इंद्र हा देवाधीपती. इंद्राला सुद्धा वेदांमध्ये गणपतीनावाने संबोधल्या गेले आहे. रुद्र हे वेदां मधील शिवाचे रूप म्हणजे हा सुद्धा गणांचा अधीपती म्हणजे गणपतीच होय. गणपत्यथर्वशीर्षात गणपतीला ‘शिवसुत’ म्हटले आहे.
गणपती हा यक्षस्वरूप असावा. त्याचे मोठे पोट, प्राण्याचा चेहरा व त्याचे विनायक म्हणजेच “विघ्नकर्त्याचे” स्वरूप या गोष्टीला पुष्टी जोडतात. जुन्या काळापासूनच यक्षाच्या दोन प्रकारच्या स्वरूपाची कल्पना केली गेली होती. एक म्हणजे रूप अत्यंत सुंदर, अद्भुत सामर्थ्यवान व लोकांचे कल्याण करणारे असे मानले जात असे. तर दुसऱ्या रूपात बटबटीत डोळे पसरलेले तोंड आखूड मांड्या,सुटलेले पोट अशा भयंकर देहाची कल्पना केली जात असे. गणपतीला पाहता तोही काहीसा याच स्वरूपाचा भासतो.
विनायक म्हणजे काय तर विनायकांचे स्वरूप मानव गृह्यसूत्र या ग्रंथात सांगितले आहे की “ विनायकांनी ग्रासलेल्या मनुष्याची मनस्थिती आणि कार्यकलाप यात विसंगती निर्माण होते. त्यांना वाईट स्वप्न येऊ लागतात. मनुष्य भय व तसेच आश्चर्यकारक स्वप्न पाहू लागतो, कन्यांचा विवाह अववृद्ध होतो. राजकुमारांना राज्यप्राप्ती होत नाही. मातेच्या समोर पुत्रांचा मृत्यू होतो.”
गजानन आणि विनायक यांच्या उत्पत्ती बद्दल आणखी एक कथा वराहपुराणात आली आहे ती अशी…जनांत पापकार्ये निर्विघ्न होऊ लागल्यामुळे देवचिंतित झाले व रुद्राकडे गेले. रुद्र पार्वतीकडे पाहून हसला व त्याचे आकाश तत्वाचा प्रतिनिधी म्हणून एक पुरुष प्रगट झाला. पार्वती त्याच्या सौंदर्याला न्याहाळू लागली. त्यामुळे शिव चिडला व त्याने त्या पुरुषाला ‘तुला हत्तीचे तोंड असेल सापांचे जाणवे घालशील व तुझे पोट सुटलेले राहील.’ असा शाप दिला. याचवेळी कित्येक विनायकांची उत्पत्ती झाली.पुढे ब्रह्मदेवाने रतबदली केल्यामुळे हा गजानन शंकराच्या कृपेने सर्व विनायकांचा अधिपती झाला. गणेशा संबंधिच्या कथा कोणत्याही असल्या तरी त्या एकच गोष्ट निर्देशीत करतात ते म्हणजे गणेश हा ‘अयोनीज’ आहे. प्रतिष्ठित आणि उच्च वर्गात त्याला सामावण्यासाठी त्याला पुढे शिवगणात शामिल केले गेले असावे.
याज्ञवल्क्य या महत्वाच्या स्मृतीत असे म्हटले आहे की “ रुद्र आणि ब्रह्मा यांनी कर्मात विघ्न निर्माण करण्यासाठी गणांच्या अधिपत्याचे ठायी नियुक्ती केली” याच ग्रंथात म्हटले आहे की “ ज्यास विनायकाने जास्त उपसर्ग केला आहे तो स्वप्नात पाण्याच्या मोठ्या प्रवाहात आपण वाहत जात आहोत किंवा बुडत आहोत असे पाहतो, ज्याच्या मस्तकाचे मुंडन केले आहे अशा पुरुषास लाल - काळी वस्त्रे नेसलेल्या वा पांघरलेल्या मनुष्यास पाहतो, कच्चे मांस भक्षण करणाऱ्या गृध्रादी पक्षावर आणि व्याघ्रादी पशुवर आरवन केलेले पाहतो, चांडाल आदी यांनी परिवेष्टित असून आपण जात आहोत आणि आपल्या मागून शत्रू येत आहेत असे पाहतो. चित्त नेहमी विक्षिप्त असणे कोणत्याही कामात यश न येणे, कोणतेच कारण नसताना मन उदास होणे , राजपुत्रास राज्य न मिळणे कुमारीस पती न मिळणे, अपत्य न होणे, गर्भधारणा न होणे, अध्ययन व अर्थज्ञान असताही आचार्य प्राप्त न होणे, योग्यता असूनही विज्ञान व्यापारात लाभ न होणे, शेतकऱ्यास फल प्राप्त न होने इत्यादी कष्ट होतात.”
या उल्लेखांवरून गणेशाची म्हणजेच विनायकां संबंधीची सुरुवातीची लोकधारणा काय होती हे कळते. या विनायकांना कोणत्याही कामा पहिले पूजल्यास ते अडथळे आणत नाहीत अशी लोकसमजूत होती. गणेशाला आज सुद्धा आपण कोणत्याही शुभ कार्या पहिले त्याचे पूजन करतो. त्याचे आवाहन करतो. महाभारताच्या अनुशासन पर्वात गणेश्वर आणि विनायकांचा उल्लेख आला आहे. त्यात म्हटलंय की हे विनायक मानवांवर लक्ष ठेवतात आणि ते सर्वीकडे असतात. ते सामान्यां मधील दृष्ट प्रवृत्तीचा नाश करतात.
अशीच एक कल्पना टोटेम संबंधीची आहे. आदिम समाजात टोळ्यांची विशिष्ट चिन्हे असत. त्यास कुलचिन्हे म्हटले तरी चालेल.ती चिन्हे पशुपक्षी, वृक्ष, हत्यारे इत्यादींची होती. गणांनाही अशी चिन्हे असत. गणांची हत्ती, वाघ, अस्वल, वानर, कोल्हा, कुत्रा, वड, पिंपळ, मानवी कवटी इत्यादी चिन्हे होती. यापैकी “ गजानुयायी लोक हत्तीचे रूपडे करून आपल्या तोंडावर घालीत व अशारितीने आपले गजानुयायित्व लोकांसमोर प्रगट करीत असे मला वाटले ” हे लो. अणे यांनी आपल्या ‘गणपतिदेवता’ या शोधनिबंधात नमूद करतात.
मध्यकाळातील स्कंदपुराणात(काशिखंड) वानर, सिंह व हत्ती अशा त्रिमूखी आणि पंचमुखी विनायकांचा उल्लेख आला आहे.गणेश पुराण व मुद्गलपुराण अशी दोन स्वतंत्र उपपुराणे महाराष्ट्रातील गणेश भक्तांनी रचली आहेत. महाराष्ट्रातील गणेशाला आलेले महत्व पाहता येथे इ. स. च्या 9-10 व्या शतकात स्वतंत्र असा गाणपत्य संप्रदाय अस्तित्वात असावा असे दिसते. मुद्गलपुराण,ब्रह्म पुराण, ब्रह्मांड पुराण यात गणेशाचे महत्व याच काळात सांगितल्या गेले.
इ. स. पूर्व काळापासून ते 8-9 व्या शतका पर्यंत गणेशाची उपासना व त्याचे महत्व कसे वाढत गेले हे अनेक पुरातात्विक पुराव्यावरून पाहता येते. गणेश उपासनेमागील अनेक सामाजिक धारणा होत्या. समाजात असलेले यक्षांचे महत्व, विनायकांची सामान्यां मध्ये असलेली भीती ही गणेशाला सर्व स्तरात मान्यता प्राप्त होण्यास कारणीभूत झाली. आज गणेशाची होणारी पूजा ही एका अर्थाने विनायकांच्या शांतीसाठीचीच पूजा आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही...
©पृथ्वीराज धवड
.
श्रींचा जन्मोत्सवा ची कथा..
....गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे आज भाद्रपद शुद्ध ०३ तृतिया आज आपण श्री मयुरेश्वर अवताराविषियी जाणून घेणार आहोत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशीचा मोरया चा जन्मोत्सव याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत अष्टविनायकांमध्ये एक श्री गिरिजात्मज लेण्याद्री यांचे प्राकट्य देखील याच कथेमध्ये आहे..
त्रेतायुगातील कथा आहे, मिथीला प्रांतात, गंडकी नामक नगरीत चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत असे परंतु त्याला संतती नव्हती सतत चिंताग्रस्त राजाला ऐके दिवशी महर्षी शौनक भेटले. राजाने महर्षीना आपली व्यथा सांगितली त्यावर महर्षीनी त्यांना सूर्य उपासनेचा उपदेश केला. राजा ने पत्नीसह भगवान सूर्यांची कठोर आराधना केली, अखेर भगवान सूर्यांनी त्यांच्या पोटी अंश रूपात जन्म घेण्याचा वर प्रदान केला परंतु भगवान सूर्यांच्या तेजाची इतकी तीव्र उष्णता होती की राणीच्या गर्भाचा असहाय्य दाह होऊ लागला, अखेर राणीने अनिच्छेने समुद्र किनारी गर्भ त्याग केला, परंतु साक्षात सूर्यांचा अंश असल्यामुळे समुद्रानेच गर्भ जगवला त्याचं नाव सिंधू ठेवण्यात आलं, परंतु मातृ संस्कार विरहित जगलेला गर्भ त्यामुळे सिंधू हा क्रूर असुरांप्रमाणे वर्तन करू लागला. ऐके दिवशी सिंधूच्या मनात प्रश्न आला की आपणही इतर असूरांप्रमाणेच तपश्चर्या करून संपूर्ण त्रैलोक्य गिळंकृत करायला हवं त्यानेही सूर्याची घोर तपश्चर्या केली त्यावर प्रसन्न सूर्याने त्याच्या कंठात अमृतकलश स्थापित केला आणि वर दिला, "जोवर हा कलश कंठात असेल तोवर तुझा मृत्यू असंभव असेल". अखेर वरदानावश त्याने त्रैलोक्य विजय केला, त्रिमूर्ती देखील आपले निवासस्थान सोडून त्र्यंबकेश्वर क्षेत्री महर्षी गौतमांच्या आश्रमात राहू लागले. त्र्यंबकेश्वर क्षेत्री निवास करतांना ऐके दिवशी शंकर ध्यान करीत होतो, पार्वतीने कोणाचे ध्यान करतात? असा प्रश्न विचारला त्यावर शंकरांनी पार्वतीला गणेश तत्वज्ञान समजून सांगितले.ॐकार ब्रम्हाचे अलौकिक महात्म्य समजावून घेतल्यावर देवी पार्वतीला गणेश दर्शनाची इच्छा जागृत झाली, तिने शंकरांकडून मंत्रोपदेश घेतला आणि लेण्याद्री क्षेत्री तपश्चर्या केली आणि साक्षात गणेशांना पुत्र रुपात प्राप्त करण्याचा वर मिळवला, दुसरीकडे सर्व देवताही सिंधुच्या अत्याचाराने त्रस्त होऊन भगवान गणेशांना शरण गेल्या, बराच काळ उलटला देवी पार्वती भगवान गणेशांना पुत्र रूपात प्राप्त करण्यासाठी आतुर झाल्या होत्या अखेर त्यांनी पुनः श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा पार्थिव व्रत आरंभ केला, ज्यात रोज एक " मृत्तीकेची नवीन मूर्ती तयार करायची आणी रोज तीचे पुजन करून विसर्जित करायची, असा संपूर्ण एक मासाचा पार्थिव गणेश व्रत केला.
आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला स्वाती नक्षत्रावर, मध्याह्न समयी मोरया लेण्याद्री येथे पार्थिव मूर्तीतून प्रकट झाले म्हणून या ठिकाणी श्री गिरिजात्मज म्हणजे गिरीजीचा पुत्र गिरीजा म्हणजे पार्वती आणि पार्वतीचा पुत्र असणारा तो गिरीजात्मज अशी देखील मूर्ती तिथे स्थापन झाली. पुढे या गणेशाने मयूर म्हणजे मोर हे वाहन धारण केले आणि मयुरेश्वर नाव धारण करून त्याने सिंधुरासुराचा वध केला मयुरेश्वर अवतार प्रयोजनार्थ झाले, अनेक लिला केल्या आणी सिंधू दैत्याचा नाश केला.
आपण आज ज्याला गणेशोत्सव म्हणतो, तो हाच मयुरेश्वर अवताराचा जन्मोत्सव आहे, जो अनेक युगांपासुन गाणपत्य सांप्रदायात व्रत स्वरूपात केला जातो, परंतु स्वातंत्र्य काळात टिळकांनी या व्रताला सार्वजनिक स्वरूप दिले, त्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढत गेली आणी प्रतिपदा ते चतुर्थी असणारा व्रत पुढे चतुर्दशी पर्यंत साजरा होत महाराष्ट्राचा महाउत्सव "गणेशोत्सव" झाला.
- संदर्भ ग्रंथ श्री मुद्गल महापुराण
श्री बल्लाळेश्वर पाली ballaleswara ganpati pali
श्रींचा जन्मोत्सवा ची कथा..
....गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे आज भाद्रपद शुद्ध ०३ तृतिया आज आपण श्री मयुरेश्वर अवताराविषियी जाणून घेणार आहोत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशीचा मोरया चा जन्मोत्सव याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत अष्टविनायकांमध्ये एक श्री गिरिजात्मज लेण्याद्री यांचे प्राकट्य देखील याच कथेमध्ये आहे..
त्रेतायुगातील कथा आहे, मिथीला प्रांतात, गंडकी नामक नगरीत चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत असे परंतु त्याला संतती नव्हती सतत चिंताग्रस्त राजाला ऐके दिवशी महर्षी शौनक भेटले. राजाने महर्षीना आपली व्यथा सांगितली त्यावर महर्षीनी त्यांना सूर्य उपासनेचा उपदेश केला. राजा ने पत्नीसह भगवान सूर्यांची कठोर आराधना केली, अखेर भगवान सूर्यांनी त्यांच्या पोटी अंश रूपात जन्म घेण्याचा वर प्रदान केला परंतु भगवान सूर्यांच्या तेजाची इतकी तीव्र उष्णता होती की राणीच्या गर्भाचा असहाय्य दाह होऊ लागला, अखेर राणीने अनिच्छेने समुद्र किनारी गर्भ त्याग केला, परंतु साक्षात सूर्यांचा अंश असल्यामुळे समुद्रानेच गर्भ जगवला त्याचं नाव सिंधू ठेवण्यात आलं, परंतु मातृ संस्कार विरहित जगलेला गर्भ त्यामुळे सिंधू हा क्रूर असुरांप्रमाणे वर्तन करू लागला. ऐके दिवशी सिंधूच्या मनात प्रश्न आला की आपणही इतर असूरांप्रमाणेच तपश्चर्या करून संपूर्ण त्रैलोक्य गिळंकृत करायला हवं त्यानेही सूर्याची घोर तपश्चर्या केली त्यावर प्रसन्न सूर्याने त्याच्या कंठात अमृतकलश स्थापित केला आणि वर दिला, "जोवर हा कलश कंठात असेल तोवर तुझा मृत्यू असंभव असेल". अखेर वरदानावश त्याने त्रैलोक्य विजय केला, त्रिमूर्ती देखील आपले निवासस्थान सोडून त्र्यंबकेश्वर क्षेत्री महर्षी गौतमांच्या आश्रमात राहू लागले. त्र्यंबकेश्वर क्षेत्री निवास करतांना ऐके दिवशी शंकर ध्यान करीत होतो, पार्वतीने कोणाचे ध्यान करतात? असा प्रश्न विचारला त्यावर शंकरांनी पार्वतीला गणेश तत्वज्ञान समजून सांगितले.ॐकार ब्रम्हाचे अलौकिक महात्म्य समजावून घेतल्यावर देवी पार्वतीला गणेश दर्शनाची इच्छा जागृत झाली, तिने शंकरांकडून मंत्रोपदेश घेतला आणि लेण्याद्री क्षेत्री तपश्चर्या केली आणि साक्षात गणेशांना पुत्र रुपात प्राप्त करण्याचा वर मिळवला, दुसरीकडे सर्व देवताही सिंधुच्या अत्याचाराने त्रस्त होऊन भगवान गणेशांना शरण गेल्या, बराच काळ उलटला देवी पार्वती भगवान गणेशांना पुत्र रूपात प्राप्त करण्यासाठी आतुर झाल्या होत्या अखेर त्यांनी पुनः श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा पार्थिव व्रत आरंभ केला, ज्यात रोज एक " मृत्तीकेची नवीन मूर्ती तयार करायची आणी रोज तीचे पुजन करून विसर्जित करायची, असा संपूर्ण एक मासाचा पार्थिव गणेश व्रत केला.
आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला स्वाती नक्षत्रावर, मध्याह्न समयी मोरया लेण्याद्री येथे पार्थिव मूर्तीतून प्रकट झाले म्हणून या ठिकाणी श्री गिरिजात्मज म्हणजे गिरीजीचा पुत्र गिरीजा म्हणजे पार्वती आणि पार्वतीचा पुत्र असणारा तो गिरीजात्मज अशी देखील मूर्ती तिथे स्थापन झाली. पुढे या गणेशाने मयूर म्हणजे मोर हे वाहन धारण केले आणि मयुरेश्वर नाव धारण करून त्याने सिंधुरासुराचा वध केला मयुरेश्वर अवतार प्रयोजनार्थ झाले, अनेक लिला केल्या आणी सिंधू दैत्याचा नाश केला.
आपण आज ज्याला गणेशोत्सव म्हणतो, तो हाच मयुरेश्वर अवताराचा जन्मोत्सव आहे, जो अनेक युगांपासुन गाणपत्य सांप्रदायात व्रत स्वरूपात केला जातो, परंतु स्वातंत्र्य काळात टिळकांनी या व्रताला सार्वजनिक स्वरूप दिले, त्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढत गेली आणी प्रतिपदा ते चतुर्थी असणारा व्रत पुढे चतुर्दशी पर्यंत साजरा होत महाराष्ट्राचा महाउत्सव "गणेशोत्सव" झाला.
- संदर्भ ग्रंथ श्री मुद्गल महापुराण
श्री बल्लाळेश्वर पाली ballaleswara ganpati pali
गणपती अथर्वशीर्ष हे गणपतीचे उपनिषद मानले जाते. यात गणपतीची तत्त्वस्वरूप व्याख्या, विश्वातील त्यांचे स्थान आणि उपासकाला मिळणारे फळ सांगितले आहे.
---
गणपती अथर्वशीर्ष (मूळ संस्कृत) आणि मराठी भाषांतर
१.
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।
त्वमेव केवलं कर्ताऽसि ।
त्वमेव केवलं धर्ताऽसि ।
त्वमेव केवलं हर्ताऽसि ।
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ॥१॥
मराठी अर्थ :
ॐ गणपती, तुला नमस्कार.
तू प्रत्यक्ष तत्त्व आहेस.
फक्त तूच या जगाचा कर्ता आहेस,
फक्त तूच धारक आहेस,
फक्त तूच संहारक आहेस.
हे सर्व ब्रह्म तूच आहेस.
तूच साक्षात आत्मा आहेस.
---
२.
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥२॥
अर्थ :
मी ऋत (नियम व सत्य) बोलतो, सत्य बोलतो.
---
३.
अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् ।
अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् ॥३॥
अर्थ :
हे गणपती, मला रक्षण दे.
वक्ता (बोलणारा), श्रोता (ऐकणारा),
दाता (दान करणारा), धाता (सांभाळ करणारा),
विद्यार्थी आणि शिष्य – या सर्वांचे रक्षण कर.
---
४
सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ।
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।
त्वं चत्वारि वाक्पदानि ॥४॥
अर्थ :
हे संपूर्ण जग तुझ्यापासून निर्माण झाले आहे.
ते तुझ्यामुळेच टिकते, तुझ्यातच लय पावते.
तूच भूमी, जल, अग्नी, वायु आणि आकाश आहेस.
तूच वाणीची चार पदे आहेस (परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी).
---
५.
त्वं गुणत्रयातीतः । त्वं अवस्थात्रयातीतः ।
त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः ।
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ॥५॥
अर्थ :
तू सत्त्व, रज, तम या गुणांपलीकडे आहेस.
जाग्रत्, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांपलीकडे आहेस.
स्थूल, सूक्ष्म व कारण शरीर या तिन्हींपलीकडे आहेस.
भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळांपलीकडे आहेस.
तू सदैव मूलाधार चक्रात वास करतोस.
---
६.
त्वं शक्तित्रयात्मकः ।
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं
इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं
चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम् ॥६॥
अर्थ :
तूच तीन शक्तींचा (इच्छा, क्रिया, ज्ञान) अधिष्ठाता आहेस.
योगीजन तुला नेहमी ध्यान करतात.
तूच ब्रह्मा, तूच विष्णु, तूच रुद्र आहेस.
तूच इंद्र, अग्नी, वायु, सूर्य, चंद्र आहेस.
तूच ब्रह्म, भूः, भुवः, स्वः आहेस.
---
७.
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् ।
अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् ।
तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् ॥७॥
अर्थ :
‘ग’ हा अक्षर प्रथम उच्चारून त्यानंतर ‘ण’ उच्चरावे.
अनुस्वार (ं), अर्धचंद्र (◌ं) आणि नाद यांनी युक्त हा तुझा मंत्रस्वरूप ओंकार आहे.
---
८.
गकारः पूर्वरूपम् ।
अकारो मध्यरूपम् ।
णकारः पररूपम् ।
बिन्दुरुत्तररूपम् ।
नादः संधानम् ।
सङ्घीतं संधिः ॥८॥
अर्थ :
‘ग’ हे पूर्वरूप, ‘अ’ हे मध्यरूप, ‘ण’ हे पररूप, बिंदू (ं) हे उत्तररूप,
नाद हा संधान व संधी आहे.
---
९.
सैषा गणेशविद्या ।
गणक ऋषिः ।
निचृद्गायत्री छन्दः ।
गणपतिर्देवता ।
ॐ गं गणपतये नमः ॥९॥
अर्थ :
ही गणेशविद्या आहे.
गणक ऋषी आहेत, निचृत् गायत्री हे छंद आहेत,
गणपति ही देवता आहे.
मंत्र : ॐ गं गणपतये नमः
---
१०.
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥१०॥
अर्थ :
आपण एकदंत गणपतीला जाणतो, वक्रतुण्डाला ध्यान करतो.
तो दंती देव आम्हाला प्रबोधन करो.
---
११.
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् ।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।
रक्तगन्धाऽनुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितम् ।
भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम् ।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥११॥
अर्थ :
एकदंत, चार हात असलेले, पाश व अंकुश धारण करणारे,
वरद (वर देणारे) हात असलेले, मूषकध्वजधारी,
लालवर्णी, लांब पोटाचे, शूर्पकर्ण असलेले, लाल वस्त्रांनी अलंकृत,
लाल चंदनाने अंगाने सुगंधित, लाल फुलांनी पूजिलेले,
भक्तांवर करुणा करणारे, जगत्कारण असलेले, अच्युत,
सृष्टीच्या आरंभी प्रकृती व पुरुष यांच्यापलीकडे प्रकट झालेले –
जो माणूस अशा स्वरूपात नित्य ध्यान करतो, तो योगीमध्ये श्रेष्ठ होतो.
---
१२.
नमो व्रातपतये । नमो गणपतये ।
नमः प्रमथपतये ।
नमस्तेऽस्तु lambodarāya ।
एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः ॥१२॥
अर्थ :
व्रातपती गणपतीला नमस्कार.
प्रमथपती गणपतीला नमस्कार.
लांबोदर, एकदंत, विघ्ननाशक, शिवसुत, वरद मूर्ती तुला नमस्कार.
---
उपसंहार
अर्थ : या उपनिषदाचा भाव असा आहे की गणपती म्हणजेच परब्रह्म.
तेच सृष्टीचे कारण, पालनकर्ता व संहारकर्ता आहेत.
योगी त्यांचे ध्यान करतात.
या अथर्वशीर्षाचा नित्य जप केल्यास विद्या, बुद्धी, आयुष्य, आरोग्य आणि समृद्धी मिळते असे सांगितले आहे.
गणपतीचे प्रत्येक अंग, प्रत्येक अवयव आणि त्याच्या मूर्तीतील प्रत्येक घटक हा फक्त शिल्पकलेचा भाग नसून त्यामागे खोल अध्यात्मिक, तात्त्विक आणि मानसशास्त्रीय प्रतीकात्मक अर्थ आहे. हिंदू धर्मशास्त्र, उपनिषदे, पुराणे आणि तंत्रशास्त्रानुसार गणपतीचे सहा हात, सोंड, डोळे, मस्तक, पोट, पाय, कान, मद, दात आणि गंडस्थळे ही सर्व काही जीवनातील गहन सत्य, तत्त्वज्ञान आणि आचारधर्माचे प्रतीक आहेत. चला, प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा पाहूया:
---
१. सहा हात (षड्भुजा)
गणपतीचे सहा हात म्हणजे षड्-ऋतू आणि षड्-शड्रिपू (सहा शत्रू) यांवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती दाखवतात.
षड्-ऋतू: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर
→ मनुष्याला प्रत्येक ऋतूतील जीवनशैलीशी जुळवून घेण्याची शिकवण.
षड्-शड्रिपू: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य
→ हे सहा शत्रू जिंकूनच आत्मसाक्षात्कार साध्य होतो.
त्यामुळे गणपतीच्या सहा हातांतून कर्म, ज्ञान, साधना, नियंत्रण आणि संतुलनाचे प्रतीक दिसते.
---
२. सोंड (सूंड)
गणपतीची सोंड ज्ञान, अनुकूलता आणि कार्यकौशल्य यांचे प्रतीक आहे.
हत्तीची सोंड जशी कधी कोमलतेने सुई उचलते तर कधी प्रचंड वृक्ष उखडते, त्याप्रमाणेच जीवनात सूक्ष्म व स्थूल दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.
सोंड म्हणजे विवेकबुद्धी — सत्य आणि असत्य वेगळे करण्याची क्षमता.
---
३. डोळे
गणपतीचे दोन डोळे सत्य व ज्ञानाचे दृष्टीकोन दाखवतात.
दोन डोळे म्हणजे भौतिक जग आणि अध्यात्मिक जग — दोन्ही समजून घेण्याची क्षमता.
काही मूर्तींमध्ये तिसरा डोळाही असतो, तो अंतर्दृष्टी किंवा आत्मज्ञान याचे प्रतीक आहे.
---
४. मस्तक (मोठे डोके)
गणपतीचे विशाल मस्तक मोठा विचार, सखोल चिंतन आणि व्यापक दृष्टिकोन यांचे प्रतीक आहे.
आपले विचार सीमित नसावेत, ते विस्तृत व सार्वत्रिक असावेत, ही शिकवण गणपतीचे मस्तक देते.
---
५. पोट (मोठे पोट)
गणपतीचे मोठे पोट म्हणजे सहनशीलता, स्वीकार आणि समाधान.
जीवनात सुख-दुःख, यश-अपयश, लाभ-हानी सर्वकाही पचवण्याची कला गणपती शिकवतात.
तसंच, हे विश्वाचे प्रतीक आहे — सर्व जगत, पाप-पुण्य, ब्रह्मांड एकत्र धारण करणारे.
---
६. पाय
गणपतीचे पाय दोन तत्त्वांचे प्रतीक आहेत:
एक पाय जमिनीवर → भौतिक जगाशी जोडलेले राहणे
दुसरा पाय वर → आध्यात्मिक उन्नतीकडे झेप घेणे
ही समतोल साधण्याची शिकवण आहे.
---
७. कान (मोठे कान)
गणपतीचे मोठे कान म्हणजे जास्त ऐका, कमी बोला ही तत्त्वज्ञानाची शिकवण.
शहाणपण फक्त बोलण्यात नाही, तर समजून घेण्यात आणि ऐकण्यात आहे.
कान ज्ञानसंकलन आणि विवेकशक्तीचे प्रतीक आहेत.
---
८. मस्तकावरील मद (गजमद)
हत्ती रुतूमध्ये येतो तेव्हा त्याच्या मस्तकावरून गंधयुक्त द्रव (मद) वाहतो.
हा मद प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि सर्जनशीलता यांचे प्रतीक आहे.
पण हा अहंकार नाही, तर अंतर्गत शक्तीचे नियंत्रित प्रकटीकरण आहे.
---
९. दात (मोठा आणि तुटलेला दात)
गणपतीचा एक दात पूर्ण आणि दुसरा तुटलेला असतो.
पूर्ण दात: आनंद, श्रद्धा, जीवनातील स्थैर्य
तुटलेला दात: त्याग, दुःख, जीवनातील बदलाची स्वीकृती
महाभारतातील परंपरेनुसार, गणपतींनी महाभारत लिहिताना आपला दात तोडून लेखणी म्हणून वापरला — यावरून ज्ञानासाठी त्याग हेही शिकवण मिळते.
---
१०. गंडस्थळे (मस्तकाच्या बाजूचे फुगलेले भाग)
गणपतीच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंची गंडस्थळे म्हणजे प्रसन्नता, सौंदर्य आणि आत्मविश्वास.
हत्ती रागावल्यावर गंडस्थळांमधून द्रव वाहतो, म्हणून हे प्रचंड सामर्थ्य आणि अंतर्गत ऊर्जा यांचेही प्रतीक आहे.
आध्यात्मिक दृष्टीने हे ओज, तेज आणि प्राणशक्ती दर्शवतात.
---
सारांश
गणपतीच्या मूर्तीतील प्रत्येक भाग म्हणजे जीवन, ज्ञान, नियंत्रण, समतोल आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे.
सहा हात → शड्रिपूंवर विजय
सोंड → विवेकबुद्धी
डोळे → अंतर्दृष्टी
मस्तक → मोठा विचार
पोट → सहनशीलता
पाय → भौतिक आणि अध्यात्मिक संतुलन
कान → जास्त ऐकणे
मद → नियंत्रित ऊर्जा
दात → त्याग आणि स्थैर्य
गंडस्थळे → प्रसन्नता आणि सामर्थ्य.
गणपतीचे प्रत्येक अंग, प्रत्येक अवयव आणि त्याच्या मूर्तीतील प्रत्येक घटक हा फक्त शिल्पकलेचा भाग नसून त्यामागे खोल अध्यात्मिक, तात्त्विक आणि मानसशास्त्रीय प्रतीकात्मक अर्थ आहे. हिंदू धर्मशास्त्र, उपनिषदे, पुराणे आणि तंत्रशास्त्रानुसार गणपतीचे सहा हात, सोंड, डोळे, मस्तक, पोट, पाय, कान, मद, दात आणि गंडस्थळे ही सर्व काही जीवनातील गहन सत्य, तत्त्वज्ञान आणि आचारधर्माचे प्रतीक आहेत. चला, प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा पाहूया:
---
१. सहा हात (षड्भुजा)
गणपतीचे सहा हात म्हणजे षड्-ऋतू आणि षड्-शड्रिपू (सहा शत्रू) यांवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती दाखवतात.
षड्-ऋतू: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर
→ मनुष्याला प्रत्येक ऋतूतील जीवनशैलीशी जुळवून घेण्याची शिकवण.
षड्-शड्रिपू: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य
→ हे सहा शत्रू जिंकूनच आत्मसाक्षात्कार साध्य होतो.
त्यामुळे गणपतीच्या सहा हातांतून कर्म, ज्ञान, साधना, नियंत्रण आणि संतुलनाचे प्रतीक दिसते.
---
२. सोंड (सूंड)
गणपतीची सोंड ज्ञान, अनुकूलता आणि कार्यकौशल्य यांचे प्रतीक आहे.
हत्तीची सोंड जशी कधी कोमलतेने सुई उचलते तर कधी प्रचंड वृक्ष उखडते, त्याप्रमाणेच जीवनात सूक्ष्म व स्थूल दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.
सोंड म्हणजे विवेकबुद्धी — सत्य आणि असत्य वेगळे करण्याची क्षमता.
---
३. डोळे
गणपतीचे दोन डोळे सत्य व ज्ञानाचे दृष्टीकोन दाखवतात.
दोन डोळे म्हणजे भौतिक जग आणि अध्यात्मिक जग — दोन्ही समजून घेण्याची क्षमता.
काही मूर्तींमध्ये तिसरा डोळाही असतो, तो अंतर्दृष्टी किंवा आत्मज्ञान याचे प्रतीक आहे.
---
४. मस्तक (मोठे डोके)
गणपतीचे विशाल मस्तक मोठा विचार, सखोल चिंतन आणि व्यापक दृष्टिकोन यांचे प्रतीक आहे.
आपले विचार सीमित नसावेत, ते विस्तृत व सार्वत्रिक असावेत, ही शिकवण गणपतीचे मस्तक देते.
---
५. पोट (मोठे पोट)
गणपतीचे मोठे पोट म्हणजे सहनशीलता, स्वीकार आणि समाधान.
जीवनात सुख-दुःख, यश-अपयश, लाभ-हानी सर्वकाही पचवण्याची कला गणपती शिकवतात.
तसंच, हे विश्वाचे प्रतीक आहे — सर्व जगत, पाप-पुण्य, ब्रह्मांड एकत्र धारण करणारे.
---
६. पाय
गणपतीचे पाय दोन तत्त्वांचे प्रतीक आहेत:
एक पाय जमिनीवर → भौतिक जगाशी जोडलेले राहणे
दुसरा पाय वर → आध्यात्मिक उन्नतीकडे झेप घेणे
ही समतोल साधण्याची शिकवण आहे.
---
७. कान (मोठे कान)
गणपतीचे मोठे कान म्हणजे जास्त ऐका, कमी बोला ही तत्त्वज्ञानाची शिकवण.
शहाणपण फक्त बोलण्यात नाही, तर समजून घेण्यात आणि ऐकण्यात आहे.
कान ज्ञानसंकलन आणि विवेकशक्तीचे प्रतीक आहेत.
---
८. मस्तकावरील मद (गजमद)
हत्ती रुतूमध्ये येतो तेव्हा त्याच्या मस्तकावरून गंधयुक्त द्रव (मद) वाहतो.
हा मद प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि सर्जनशीलता यांचे प्रतीक आहे.
पण हा अहंकार नाही, तर अंतर्गत शक्तीचे नियंत्रित प्रकटीकरण आहे.
---
९. दात (मोठा आणि तुटलेला दात)
गणपतीचा एक दात पूर्ण आणि दुसरा तुटलेला असतो.
पूर्ण दात: आनंद, श्रद्धा, जीवनातील स्थैर्य
तुटलेला दात: त्याग, दुःख, जीवनातील बदलाची स्वीकृती
महाभारतातील परंपरेनुसार, गणपतींनी महाभारत लिहिताना आपला दात तोडून लेखणी म्हणून वापरला — यावरून ज्ञानासाठी त्याग हेही शिकवण मिळते.
---
१०. गंडस्थळे (मस्तकाच्या बाजूचे फुगलेले भाग)
गणपतीच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंची गंडस्थळे म्हणजे प्रसन्नता, सौंदर्य आणि आत्मविश्वास.
हत्ती रागावल्यावर गंडस्थळांमधून द्रव वाहतो, म्हणून हे प्रचंड सामर्थ्य आणि अंतर्गत ऊर्जा यांचेही प्रतीक आहे.
आध्यात्मिक दृष्टीने हे ओज, तेज आणि प्राणशक्ती दर्शवतात.
---
सारांश
गणपतीच्या मूर्तीतील प्रत्येक भाग म्हणजे जीवन, ज्ञान, नियंत्रण, समतोल आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहे.
सहा हात → शड्रिपूंवर विजय
सोंड → विवेकबुद्धी
डोळे → अंतर्दृष्टी
मस्तक → मोठा विचार
पोट → सहनशीलता
पाय → भौतिक आणि अध्यात्मिक संतुलन
कान → जास्त ऐकणे
मद → नियंत्रित ऊर्जा
दात → त्याग आणि स्थैर्य
गंडस्थळे → प्रसन्नता आणि सामर्थ्य.
भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमी. आज आपल्या वेदकालीन पूर्वजांचे स्मरण करण्याचा पवित्र दिवस.
नमोस्तु ऋषिवृंदेभ्यो देवर्षिभ्यो नमो नमः।
सर्वपापहरेभ्यो हि वेदविद्भ्यो नमो नमः॥
ऋषी समुदायातील जे देवर्षी आहेत, सर्व पापांचे हरण करणारे आहेत आणि वेद जाणणारे आहेत त्यांना माझा वारंवार नमस्कार असो.
ज्यांनी वेदांचे प्रकटीकरण केले. त्यांचा अर्थ सर्वसामान्य पुढील पिढ्यांना समजेल असा सुलभ करून सांगितला. शास्त्रार्थ समजावला. अलौकिक धर्मग्रंथांचे ज्ञान भंडार खुले केले. संस्कृती, संस्कार, परंपरा यांचा दिव्य वारसा आपल्याला अनंतकाळ टिकेल असा देणाऱ्या असंख्य ऋषींचा आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सप्तऋषींना वंदन करण्याचा आजचा दिवस.
अनेक सुधारणावादी लोकांना वाटते की, ऋषी म्हणजे केवळ हिमालयात जाऊन तपस्या करणारे किंवा विश्वामित्रांसारखे तेजोभंग पावणारे.. तसा आधुनिक काळात ऋषींना कुचेष्टेचा विषय केला आहे. परंतु त्यांच्या तप:साधने सोबत त्यांचे शाश्वत असलेले अक्षर साहित्य मात्र कोठेही चर्चेत येत नाही.
ऋषींनी लिहिलेल्या ग्रंथांवर आज मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे .आपण मात्र त्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्यांचे साहित्य काय होते ? हे अत्यंत थोडक्यात आज जाणून घेऊया.
१) वशिष्ठ ऋषी
वशिष्ठ ऋषींनी नऊ ग्रंथ लिहिले आहेत. वशिष्ठ संहिता, वशिष्ठ कल्प, वशिष्ठ पुराण, वशिष्ठ लिंग पुराण, वशिष्ठ शिक्षा, वशिष्ठ श्राद्धकल्प,वशिष्ठ होम प्रकार, वशिष्ठ तंत्र स्थापत्यशास्त्र इ.
२) अगस्ती ऋषी
अगस्ती ऋषींनी लिहिलेल्या
ग्रंथापैकी केवळ चार ग्रंथ उपलब्ध आहेत. अगस्त गीता, अगस्त संहिता, शिवसंहिता, द्वैध निर्णय तंत्र इत्यादी.
३) कपिल ऋषी
कपिल ऋषींनी असंख्य ग्रंथांची रचना केली पण, त्यापैकी केवळ आठ ग्रंथ उपलब्ध आहेत. सांख्यसूत्र, तत्वसमास, व्यास प्रभाकर,कपिल गीता, कपिल तंत्रज्ञान, कपिल संहिता, कपिल स्तोत्र, कपिल स्मृती इत्यादी.
४) अत्रि ऋषी
अत्रि ऋषींच्याही असंख्य ग्रंथांपैकी चार ग्रंथ सध्या उपलब्ध आहेत. अत्रि संहिता, अत्रि स्मृती, लघुअत्री स्मृती, बृहद्दत्तात्रेय स्मृती इत्यादी.
५) पराशर कृषी
पराशर ऋषींचे आठ ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यापैकी बृहत पराशर होरा शास्त्र, लघुपराशरी बृहत पराशरीयसंहिता, पराशर पुराण, पराशरोदित नीतीशास्त्रम्, पराशरोधित केवल सारम् इत्यादी
६) व्यास ऋषी
व्यासांची वाड्मयसंपदा विशालकाय आहे. त्यांचे अठरा पुराणे उपलब्ध आहेत. लिंगपुराण, स्कंदपुराण, विष्णुपुराण, गरुड पुराण, पद्मपुराण, भविष्यपुराण, वायुपुराण, नारदपुराण, ब्रम्हांडपुराण, मत्स्यपुराण, ब्रह्मपुराण, ब्रम्हवैवर्त पुराण ,भागवत पुराण, कुर्मपुराण, वामनपुराण, वराहपुराण, मार्कंडेयपुराण, अग्निपुराण इत्यादी
७) याज्ञवलक्य ऋषी
यांचे नऊ ग्रंथ उपलब्ध आहेत. शुक्ल यजुर्वेद, शतपत ब्राह्मण, योगसूत्रे, बृहद्दारन्यकोपनिषद, याज्ञवलक्य शिक्षा,
याज्ञवलक्य गीता,बृहद् याज्ञवलक्य, याज्ञवलक्य स्मृती, बृहद् योगी याज्ञवलक्य इत्यादी.
८) दुर्वास ऋषी
दुर्वास ऋषींनी चार ग्रंथांचे लेखन केलं आहे. आर्य द्विशक्ती, दैवी महिमा स्तोत्र, पाराशिव महिमा स्तोत्र, ललिता स्तवरला इत्यादी.
८) शौनक ऋषी
शौनक ऋषींचे १० ग्रंथ उपलब्ध आहेत. ऋक- प्रातीशास्त्र, छान्दानुक्रमणी, ऋष्यानुक्रमणी, अनुवाकानुक्रमणी, कनानुनुक्रमणी, बृहद देवता, ऋग्विविधान, सुक्तानुक्रमणि, पद्मविधान, चरणव्यूह इ.
९) ऋष्यशृंग
यांनी दोन ग्रंथांचे लेखन केले
ऋष्यशृंगसंहिता, ऋष्यशृंगस्मृती.
१०) मांडव्य ऋषी
मांडवी ऋषींनी एकच ग्रंथ लिहिला. तो म्हणजे मांडव्य संहिता होय.
११) भृगू ऋषी
भृगू ऋषी यांनी एकूण सहा ग्रंथ लिहिले. भृगू स्मृति , भृगूगीता भृगुसंहिता, भृगु सिद्धांत, भृगूसूत्र, स्थापत्यशास्त्र इत्यादी.
१२) गार्ग्य ऋषी
ज्योतिगार्ग्य, बृहद् गार्ग्य हे दोन ग्रंथ लिहिले.
१३) कण्व ऋषी
कण्व ऋषींनी कण्वनिती, कण्व संहिता, कान्वोपनिषद, कण्व स्मृति इत्यादी ग्रंथांचे लेखन केले.
१४) अष्टावक्र ऋषी
अष्टावक्र गीता, अष्टावक्र संहिता या दोन ग्रंथांचे त्यांनी लेखन केले.
१५) गौतम ऋषी
गौतम ऋषींचे चार ग्रंथ प्रसिद्ध आहेत. गौतम धर्मशास्त्र, गौतमस्मृती,
वृद्धगौतम, बृहदगौतम इत्यादी.
ब्रम्हर्षी, राजर्षी, देवऋषी ही महापदे ही कोणत्याही विद्यापीठाची पदवी नाही की, ती कोणापुढे लावायला. चिंतनशीलतेतून विशुद्ध विचार प्रकट होतात. चिंतनशीलतेतूनच
ब्रम्हर्षीपण प्रकट होते. आपली संस्कृती टिकवण्यासाठी धर्म टिकवण्यासाठी सत्ता पैसा तपोवनातील गुरु कार्यार्थ दान देतात ते राजर्षी. राजर्षींना देखील ब्रम्हर्षीची प्रेरणा असते. चिंतनशीलतेतून आत्मविकास साधण्यासाठी देव, दानव, मानव सर्वांच्या घरात जाऊन प्रभु प्रतिष्ठा वाढवण्याचे कुशलता साधतो तो देवर्षी.
किती लिहावे,?.. असंख्य ऋषींनी अत्यंत संपन्न, समृद्ध अक्षर ज्ञानाचा वारसा आपल्यासाठी दिला आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव ठेवून विनम्र भावे नतमस्तक.
एते सप्तर्षय: सर्वे भक्त्या संपूजिता मया l
सर्वे पापं व्यापोहंतु ज्ञानतोSज्ञानता कृतम ll
श्री. संतोष भोसेकर.
*मूर्तीमध्ये देवत्व कसे येते..?*
*वास्तविक चराचरात परमेश्वर भरलेला असतो... त्यामुळे मूर्तीमध्येही तो असतोच याविषयी संदेह नाही. पण मानवाच्या उन्नतीसाठी व आध्यात्मिक साधनेसाठी परमेश्वर विषयक ही संकल्पना पुरेशी ठरत नाही. कारण त्याला हवा असतो 'देव' आणि तोही चराचरातील नव्हे, तर समोर ठेवलेल्या मूर्तीमधील. अशा वेळी मनाचे, नेत्रांचे एकाग्र लक्ष होण्यासाठी मूर्ती किंवा फोटोवाचून गत्यंतरच नसते. मूर्तीमुळे त्याची देवविषयक जाण किंवा दखल सतत जागृत राहते. तो आपल्या नेत्रांनी सतत मूर्तीचे अवलोकन करतो, त्या मूर्तीकडे पाहताच त्याला जप करावा वाटतो व मूर्तीच्या सहवासामुळे त्या देवाचे चरित्र मनात सारखे घोळत राहते. अशा वेळी मूर्ती निर्जीव व चेतनाहीन असूनही वरील कार्ये घडतात. तर मग त्या मूर्तीतून कंपने, स्पंदन लहरी बाहेर पडू लागल्या तर केवढा परिणाम होऊ शकेल ? ही कंपने व स्पंदने बाहेर पडण्यासाठी त्या मूर्तीमध्ये काही संस्कार घडावे लागतात.....*
*मनाने त्या मूर्तीच्या सहवासात माणसांचे वास्तव्य घडले की आपोआपच त्या मूर्तीमधील देवत्व जागृत होऊ लागते. शास्त्रामध्ये मूर्तीची अर्चा (प्रतिष्ठा) सांगितलेली आहे. त्यात जलाधिवास, धान्यराशीकरण, प्राणप्रतिष्ठा, होम अशी अनेक अंगे आहेत. ती सर्व प्रातिनिधीक स्वरूपाची आहेत. केवळ नुसती स्थापना केलेली एखादी मूर्तीदेखील काही दिवसांनी दृष्टांत देऊ लागते. ज्यावेळी प्राणप्रतिष्ठेचा शास्त्रोक्त विधी माहीत नसेल, तेव्हा त्या मूर्तीची समंत्रक (किंवा अमंत्रक) षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करून देखील त्या मूर्तीमध्ये देवत्व येते. वरचेवर पंचामृत अभिषेक, उद्वार्जन (लिंबू, भस्म लावून देव स्वच्छ करणे), आरती, नवरात्रविधी इत्यादी सोपस्कारांनी मूर्तीमध्ये देवत्व सिध्द होऊन ती मूर्ती घरातील वातावरण प्रसन्न ठेवू शकते.....*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
*गणेशोत्सव : ५ हजार वर्षांपासून केले जाते पार्थिव गणपती पूजन?*
*श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे... भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता, असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात.....*
*मात्र, घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली, याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो. जाणून घेऊया...*
*चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशीपासून सुरू होते... यानंतर व्रत-वैकल्यांचा राजा मानला गेलेला श्रावण महिना सुरू होतो. श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते.....*
*एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला... महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता. असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. गणेशासंदर्भात अनेक पौराणिक कथा दिसून येतात.....*
*महाभारत लेखक गणपती...*
*महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली, हे आपल्या सर्वांना माहिती आहे... मात्र, महर्षी व्यासांनी महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणपतीकडून लिहून घेतले. घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली, असे सांगितले जाते.....*
*महाभारताची रचना करताना महर्षी व्यास आणि गणपती यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या... गणपतीला आपल्या लेखनाच्या गतीबाबत आत्मविश्वास होता. गणपती महर्षी व्यासांना म्हणाले की, तुम्ही महाभारत कथा हळूहळू सांगणार असाल, तर मला कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी. ही अट आपणास मान्य असेल, तर आणि तरच लेखनाची जबाबदारी मान्य करेन, अशी अट गणपतीने घातली.....*
*महाभारत लेखनाचा श्रीगणेशा...*
*व्यास महर्षी होते... गणपतीच्या अटीवर त्यांनी केवळ स्मित हास्य केले. महर्षी व्यास गणपतीला म्हणाले की, आपली अट मला मान्य आहे. मात्र, मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला, उमगला, तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे. अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे, अशी अट महर्षी व्यासांनी ठेवली. गणपती तयार झाले आणि त्यांनी महाभारत लेखनाचा श्रीगणेशा केला.....*
*महर्षी व्यास नेमके काय सांगताहेत, हे समजून घ्यायला अनेकदा गणपतीला विलंब व्हायला लागला... संपूर्ण महाभारत कथा समजून लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते.....*
*घरोघरी पार्थिव गणपती पूजन.*
*महाभारत कथा पूर्ण होण्यात मोठा कालावधी लोटला... कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. हा लेप लावून लावून जाडसर झाला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून महाभारताचा लेखक म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.....*
*महाभारतकालीन गणपती अवतार...*
*गणेशाने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात अवतार घेतल्याचे सांगितले जाते... गणेशाने सतयुगात कश्यप आणि अदितीकडे महोत्कट विनायकाच्या अवतार धारण केला. या युगात गणपतीने देवतान्तक आणि नरान्तक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केली आणि आपल्या अवतारकार्याची सांगता केली. गणेश त्रेता युगात मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले. तर, द्वापारयुगात गणेश उंदीरावर बसून प्रगट झाले. गणेशाला पौराणिक पत्रकार किंवा लेखक असेही संबोधले जाते. कारण याच युगातील अवतारात त्यांनी महाभारत लिहिले होते, असे सांगितले जाते.....*
*पेशवे आणि घरगुती गणेशोत्सव...*
*सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले... हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला. दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला- पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले.....*
*किर्तनकार, प्रवचनकार ह.भ.प.*
*सौ.सोंनालीताई महाराज मोरे-कापसे*
*मो.7038920920*
*🔸श्रीगणेश सहस्त्र नाम🔸*
*१. ॐ गणेशाय नम: ।*
*२. ॐ गणाध्यक्षाय नम: ।*
*३. ॐ गणाराध्याय नम: ।*
*४. ॐ गणप्रियाय नम: ।*
*५. ॐ गणनाथाय नम: ।*
*६. ॐ गणस्वामिने नम: ।*
*७. ॐ गणेशाय नम: ।*
*८. ॐ गणनायकाय नम: ।*
*९. ॐ गणमूर्तये नम: ।*
*१०. ॐ गणपतये नम: ।*
*११. ॐ गणत्रात्रे नम: ।*
*१२. ॐ गणञ्जयाय नम: ।*
*१३. ॐ गणपाय नम: ।*
*१४. ॐ गणक्रीडाय नम: ।*
*१५. ॐ गणदेवाय नम: ।*
*१६. ॐ गणाधिपाय नम: ।*
*१७. ॐ गणज्येष्ठाय नम: ।*
*१८. ॐ गणश्रेष्ठाय नम: ।*
*१९. ॐ गणप्रेष्ठाय नम: ।*
*२०. ॐ गणाधिराजे नम: ।*
*२१. ॐ गणराजे नम: ।*
*२२. ॐ गणगोप्त्रे नम: ।*
*२३. ॐ गणाङ्गाय नम: ।*
*२४. ॐ गणदैवताय नम: ।*
*२५. ॐ गणबन्धवे नम: ।*
*२६. ॐ गणसुह्रदे नम: ।*
*२७. ॐ गणाधीशाय नम: ।*
*२८. ॐ गणप्रथाय नम: ।*
*२९. ॐ गणप्रियसखाय नम: ।*
*३०. ॐ गणप्रियसुह्रदे नम: ।*
*३१. ॐ गणप्रियरताय नम: ।*
*३२. ॐ गणप्रीतिविवर्धनाय नम:*
*३३. ॐ गणमण्डलमध्यस्थाय नम: ।*
*३४. ॐ गणकेलिपरायणाय नम: ।*
*३५. ॐ गणाग्रण्ये नम: ।*
*३६. ॐ गणेशानाय नम: ।*
*३७. ॐ गणगीताय नम: ।*
*३८. ॐ गणोच्छ्रयाय नम: ।*
*३९. ॐ गण्याय नम: ।*
*४०. ॐ गणहिताय नम: ।*
*४१. ॐ गर्जद्गणसेनाय नम: ।*
*४२. ॐ गणोद्धताय नम: ।*
*४३. ॐ गणभीतिप्रमथनाय नम: ।*
*४४. ॐ गणभीत्यपहारकाय नम: ।*
*४५. ॐ गणनार्हाय नम: ।*
*४६. ॐ गणप्रौढाय नम: ।*
*४७. ॐ गणभर्त्रे नम: ।*
*४८. ॐ गणप्रभवे नम: ।*
*४९. ॐ गणसेनाय नम: ।*
*५०. ॐ गणचराय नम: ।*
*५१. ॐ गणप्राज्ञाय नम: ।*
*५२. ॐ गणैकराजे नम: ।*
*५३. ॐ गणाग्रयाय नम: ।*
*५४. ॐ गणनाम्ने नम: ।*
*५५. ॐ गणपालनतत्परय नम: ।*
*५६. ॐ गणजिते नम: ।*
*५७. ॐ गणगर्भस्थाय नम: ।*
*५८. ॐ गणप्रवणमानसाय नम: ।*
*५९. ॐ गणगर्वपरीहर्त्रे नम: ।*
*६०. ॐ गणाय नम: ।*
*६१. ॐ गणनमस्कृताय नम: ।*
*६२. ॐ गणार्चिताङ्घ्रियुगलाय नम: ।*
६३. ॐ गणरक्षणकृते नम: ।*
*६४. ॐ गणध्याताय नम: ।*
*६५. ॐ गणगुरवे नम: ।*
*६६. ॐ गणप्रणयत्पराय नम: ।*
६७. ॐ गणागणपरित्रात्रे नम: ।*
*६८. ॐ गणाधिहरणोद्धुराय नम: ।*
*६९. ॐ गणसेतवे नम: ।*
*७०. ॐ गणनुताय नम: ।*
*७१. ॐ गणकेतवे नम: ।*
*७२. ॐ गणाग्रगाय नम: ।*
*७३. ॐ गणहेतवे नम: ।*
*७४. ॐ गणग्राहिणे नम: ।*
*७५. ॐ गणानुग्रहकारकाय नम: ।*
*७६. ॐ गणागणानुग्रहभुवे नम: ।*
*७७. ॐ गणागणवरप्रदाय नम: ।*
*७८. ॐ गणस्तुताय नम: ।*
*७९. ॐ गणप्राणाय नम: ।*
*८०. ॐ गणसर्वस्वदायकाय नम: ।*
*८१. ॐ गणवल्लभमूर्तये नम: ।*
*८२. ॐ गणभूतये नम: ।*
*८३. ॐ गणेष्टदाय नम: ।*
*८४. ॐ गणसौख्यप्रदात्रे नम: ।*
*८५. ॐ गणदु:खप्रणाशनाय नम: ।*
*८६. ॐ गणप्रथितनाम्ने नम: ।*
*८७. ॐ गणाभीष्टकराय नम: ।*
*८८. ॐ गणमान्याय नम: ।*
*८९. ॐ गणख्याताय नम: ।*
*९०. ॐ गणवीताय नम: ।*
*९१. ॐ गणोत्कटाय नम: ।*
*९२. ॐ गणपालाय नम: ।*
*९३. ॐ गणवराय नम: ।*
*९४. ॐ गणगौरवदायकाय नम: ।*
*९५. ॐ गणगर्जितसंतुष्टाय नम: ।*
*९६. ॐ गणस्वच्छन्दगाय नम: ।*
*९७. ॐ गणराजाय नम: ।*
*९८. ॐ गणश्रीदाय नम: ।*
*९९. ॐ गणाभयकराय नम: ।*
*१००. ॐ गणमूर्धाभिषिक्ताय नम: ।*
*१०१. ॐ गणसैन्यपुर:सराय नम: ।*
*१०२. ॐ गुणातीताय नम: ।*
*१०३. ॐ गुणमयाय नम: ।*
*१०४. ॐ गुणत्रयविभागकृते नम: ।*
*१०५. ॐ गुणिने नम: ।*
*१०६. ॐ गुणाकृतिधराय नम: ।*
*१०७. ॐ गुणशालिने नम: ।*
*१०८. ॐ गुणप्रियाय नम: ।*
*१०९. ॐ गुणपूर्णाय नम: ।*
*११०. ॐ गुणाम्भोधये नम: ।*
*१११. ॐ गुणभाजे नम: ।*
*११२. ॐ गुणदूरगाय नम: ।*
*११३. ॐ गुणागुणवपुषे नम: ।*
*११४. ॐ गौणशरीराय नम: ।*
*११५. ॐ गुणमण्डिताय नम: ।*
*११६. ॐ गुणस्त्रष्ट्रे नम: ।*
*११७. ॐ गुणेशानाय नम: ।*
*११८. ॐ गुणेशाय नम: ।*
*११९. ॐ गुणेश्वराय नम: ।*
*१२०. ॐ गुणसृष्टजगत्संघाय नम: ।*
*१२१. ॐ गुणसंघाय नम: ।*
*१२२. ॐ गुणैकराजे नम: ।*
*१२३. ॐ गुणप्रवृष्टाय नम: ।*
*१२४. ॐ गुणभुवे नम: ।*
*१२५. ॐ गुणीकृतचराचराय नम: ।*
*१२६. ॐ गुणप्रवणसंतुष्टाय नम: ।*
*१२७. ॐ गुणहीनपराङ्मुखाय नम: ।*
*१२८. ॐ गुणैकभुवे नम: ।*
*१२९. ॐ गुणश्रेष्ठाय नम: ।*
*१३०. ॐ गुणज्येष्ठाय नम: ।*
*१३१. ॐ गुणप्रभवे नम: ।*
*१३२. ॐ गुणज्ञाय नम: ।*
*१३३. ॐ गुणसम्पूज्याय नम: ।*
*१३४. ॐ गुणैकसदनाय नम: ।*
*१३५. ॐ गुणप्रणयवते नम: ।*
*१३६. ॐ गौणप्रकृतये नम: ।*
*१३७. ॐ गुणभाजनाय नम: ।*
*१३८. ॐ गुणिप्रणतपादाब्जाय नम: ।*
*१३९. ॐ गुणिगीताय नम: ।*
*१४०. ॐ गुणोज्ज्वलाय नम: ।*
*१४१. ॐ गुणवते नम: ।*
*१४२. ॐ गुणसम्पन्नाय नम: ।*
*१४३. ॐ गुणानन्दितमानसाय नम: ।*
*१४४. ॐ गुणसंचारचतुराय नम: ।*
*१४५. ॐ गुणसंचयसुन्दराय नम: ।*
*१४६. ॐ गुणगौराय नम: ।*
*१४७. ॐ गुणाधाराय नम: ।*
*१४८. ॐ गुणसंवृतचेतनाय नम: ।*
*१४९. ॐ गुणकृते नम: ।*
*१५०. ॐ गुणभृते नम: ।*
*१५१. ॐ गुणाग्रयाय नम: ।*
*१५२. ॐ गुणपारदृशे नम: ।*
*१५३. ॐ गुणप्रचारिणे नम: ।*
*१५४. ॐ गुणयुजे नम: ।*
*१५५. ॐ गुणागुणविवेककृते नम: ।*
*१५६. ॐ गुणाकराय नम: ।*
*१५७. ॐ गुणकराय नम: ।*
*१५८. ॐ गुणप्रवणवर्धनाय नम: ।*
*१५९. ॐ गुणगूढचराय नम: ।*
*१६०. ॐ गौणसर्वसंसारचेष्टिताय नम: ।*
*१६१. ॐ गुणदक्षिणसौहार्दाय नम: ।*
*१६२. ॐ गुणलक्षणतत्त्वविदे नम: ।*
*१६३. ॐ गुणहारिणे नम: ।*
*१६४. ॐ गुणकलाय नम: ।*
*१६५. ॐ गुणसंघसखाय नम: ।*
*१६६. ॐ गुणसंस्कृतसंसाराय नम: ।*
*१६७. ॐ गुणतत्त्वविवेचकाय नम: ।*
*१६८. ॐ गुणगर्वधराय नम: ।*
*१६९. ॐ गौणसुखदु:खोदयाय नम: ।*
*१७०. ॐ गुणाय नम: ।*
*१७१. ॐ गुणाधीशाय नम: ।*
*१७२. ॐ गुणलयाय नम: ।*
*१७३. ॐ गुणवीक्षणलालसाय नम: ।*
*१७४. ॐ गुणगौरवदात्रे नम: ।*
*१७५. ॐ गुणदात्रे नम: ।*
*१७६. ॐ गुणप्रदाय नम: ।*
*१७७. ॐ गुणकृते नम: ।*
*१७८. ॐ गुणसम्बन्धाय नम: ।*
*१७९. ॐ गुणभृते नम: ।*
*१८०. ॐ गुणबन्धनाय नम: ।*
*१८१. ॐ गुणह्रद्याय नम: ।*
*१८२. ॐ गुणस्थायिने नम: ।*
*१८३. ॐ गुणदायिने नम: ।*
*१८४. ॐ गुणोत्कटाय नम: ।*
*१८५. ॐ गुणचक्रधराय नम: ।*
*१८६. ॐ गौणावताराय नम: ।*
*१८७. ॐ गुणबान्धवाय नम: ।*
*१८८. ॐ गुणबन्धवे नम: ।*
*१८९. ॐ गुणप्रज्ञाय नम: ।*
*१९०. ॐ गुणप्राज्ञाय नम: ।*
*१९१. ॐ गुणालयाय नम: ।*
*१९२. ॐ गुणधात्रे नम: ।*
*१९३. ॐ गुणप्राणाय नम: ।*
*१९४. ॐ गुणगोपाय नम: ।*
*१९५. ॐ गुणाश्रयाय नम: ।*
*१९६. ॐ गुणयायिने नम: ।*
*१९७. ॐ गुणाधायिने नम: ।*
*१९८. ॐ गुणपाय नम: ।*
*१९९. ॐ गुणपालकाय नम: ।*
*२००. ॐ गुणाह्रततनवे नम: ।*
*२०१. ॐ गौणाय नम: ।*
*२०२. ॐ गीर्वाणाय नम: ।*
*२०३. ॐ गुणगौरवाय नम: ।*
*२०४. ॐ गुणवत्पूजितपदाय नम: ।*
*२०५. ॐ गुणवत्प्रीतिदायकाय नम: ।*
*२०६. ॐ गुणवत्गीतकीर्तये नम: ।*
*२०७. ॐ गुणवद्बद्धसौह्रदाय नम: ।*
*२०८. ॐ गुणवद्वरदाय नम: ।*
*२०९. ॐ गुणवत्प्रतिपालकाय नम: ।*
*२१०. ॐ गुणवद्गुणसंतुष्टाय नम: ।*
*२११. ॐ गुणवद्रचितस्तवाय नम: ।*
*२१२. ॐ गुणव्रदक्षणपराय नम: ।*
*२१३. ॐ गुणवत्प्रणयप्रियाय नम: ।*
*२१४. ॐ गुणवच्चक्रसंचाराय नम: ।*
*२१५. ॐ गुणवत्कीर्तिवर्धनाय नम: ।*
*२१६. ॐ गुणवद्गुणचित्तस्थाय नम: ।*
*२१७. ॐ गुणवद्गुणरक्षकाय नम: ।*
*२१८. ॐ गुणवत्पोषणकराय नम: ।*
*२१९. ॐ गुणवच्छत्रुसूदनाय नम: ।*
*२२०. ॐ गुणवत्सिद्धिदात्रे नम: ।*
*२२१. ॐ गुणवद्गौरवप्रदाय नम: ।*
*२२२. ॐ गुणवत्प्रवणस्वान्ताय नम: ।*
*२२३. ॐ गुणवद्गुणभूषणाय नम: ।*
*२२४. ॐ गुणवत्कुलविद्वेषिविनाशकरणक्षमाय नम: ।*
*२२५. ॐ गुणिस्तुतगुणाय नम: ।*
*२२६. ॐ गर्जत्प्रलयाम्बुदनि:स्वनाय नम: ।*
*२२७. ॐ गजाय नम: ।*
*२२८. ॐ गजपतये नम: ।*
*२२९. ॐ गर्जद्गजयुद्धविशारदाय नम: ।*
*२३०. ॐ गजास्याय नम: ।*
*२३१. ॐ गजकर्णाय नम: ।*
*२३२. ॐ गजराजाय नम: ।*
*२३३. ॐ गजाननाय नम: ।*
*२३४. ॐ गजरूपधराय नम: ।*
*२३५. ॐ गर्जद्गजयूथोद्धुरध्वनये नम: ।*
*२३६. ॐ गजाधीशाय नम: ।*
*२३७. ॐ गजाधाराय नम: ।*
*२३८. ॐ गजासुरजयोद्धुराय नम: ।*
*२३९. ॐ गजदन्ताय नम: ।*
*२४०. ॐ गजवराय नम: ।*
*२४१. ॐ गजकुम्भाय नम: ।*
*२४२. ॐ गजध्वनये नम: ।*
*२४३. गजमायाय नम: ।*
*२४४. ॐ गजमयाय नम: ।*
*२४५. ॐ गजाश्रिये नम: ।*
*२४६. ॐ गजगर्जिताय नम: ।*
*२४७. ॐ गजामयहराय नम: ।*
*२४८. ॐ गजपुष्टिप्रदायकाय नम: ।*
*२४९. ॐ गजोत्पत्तये नम: ।*
*२५०. ॐ गजत्रात्रे नम: ।*
*२५१. ॐ गजहेतवे नम: ।*
*२५२. ॐ गजाधिपाय नम: ।*
*२५३. ॐ गजमुख्याय नम: ।*
*२५४. ॐ गजकुलप्रवराय नम: ।*
*२५५. ॐ गजदैत्यघ्ने नम: ।*
*२५६. ॐ गजकेतवे नम: ।*
*२५७. ॐ गजाध्यक्षाय नम: ।*
*२५८. ॐ गजसेतवे नम: ।*
*२५९. ॐ गजाकृतये नम: ।*
*२६०. ॐ गजवन्द्याय नम: ।*
*२६१. ॐ गजप्राणाय नम: ।*
*२६२. ॐ गजसेव्याय नम: ।*
*२६३. ॐ गजप्रभवे नम: ।*
*२६४. ॐ गजमत्ताय नम: ।*
*२६५. ॐ गजेशानाय नम: ।*
*२६६. ॐ गजेशाय नम: ।*
*२६७. ॐ गजपुङ्गवाय नम: ।*
*२६८. ॐ गजदन्तधराय नम: ।*
*२६९. ॐ गञ्जन्मधुपाय नम: ।*
*२७०. ॐ गजवेषभृते नम: ।*
*२७१. ॐ गजच्छन्नय नम: ।*
*२७२. ॐ गजाग्रस्थाय नम: ।*
*२७३. ॐ गजयायिने नम: ।*
*२७४. ॐ गजाजयाय नम: ।*
*२७५. ॐ गजराजे नम: ।*
*२७६. ॐ गजयूथस्थाय नम: ।*
*२७७. ॐ गजगञ्जकभञ्जकाय नम: ।*
*२७८. ॐ गर्जितोज्झितदैत्यासवे नम: ।*
*२७९. ॐ गर्जितत्रातविष्टपाय नम: ।*
*२८०. ॐ गानज्ञाय नम: ।*
*२८१. ॐ गानकुशलाय नम: ।*
*२८२. ॐ गानतत्त्वविवेचकाय नम: ।*
*२८३. ॐ गानश्लाघिने नम: ।*
*२८४. ॐ गानरसाय नम: ।*
*२८५. ॐ गानज्ञानपरायणाय नम: ।*
*२८६. ॐ गानगमज्ञाय नम: ।*
*२८७. ॐ गानाङ्गाय नम: ।*
*२८८. ॐ गनप्रवणचेतनाय नम: ।*
*२८९. ॐ गानकृते नम: ।*
*२९०. ॐ गानचतुराय नम: ।*
*२९१. ॐ गानविद्याविशारदाय नम: ।*
*२९२. ॐ गानध्येयाय नम: ।*
*२९३ ॐ गानगम्याय नम: ।*
*२९४. ॐ गानध्यानपरायणाय नम: ।*
*२९५. ॐ गानभुवे नम: ।*
*२९६. ॐ गानशीलाय नम: ।*
*२९७. ॐ गानशालिने नम: ।*
*२९८. ॐ गतश्रमाय नम: ।*
*२९९. ॐ गानविज्ञानसम्पन्नाय नम: ।*
*३००. ॐ गानश्रवणलालसाय नम: ।*
*३०१. ॐ गानयत्ताय नम: ।*
*३०२. ॐ गानमयाय नम: ।*
*३०३. ॐ गानप्रणयवते नम: ।*
*३०४. ॐ गानध्यात्रे नम: ।*
*३०५. ॐ गानबुद्धये नम: ।*
*३०६. ॐ गानोत्सुकमनसे नम: ।*
*३०७. ॐ गानोत्सुकाय नम: ।*
*३०८. ॐ गानभूमये नम: ।*
*३०९. ॐ गानसीम्ने नम: ।*
*३१०. ॐ गुणोज्ज्वलाय नम: ।*
*३११. ॐ गानाङ्गज्ञानवते नम: ।*
*३१२. ॐ गानमानवते नम: ।*
*३१३. ॐ गानपेशलाय नम: ।*
*३१४. ॐ गानवत्प्रणयाय नम: ।*
*३१५. ॐ गानसमुद्राय नम: ।*
*३१६. ॐ गानभूषणाय नम: ।*
*३१७. ॐ गानसिन्धवे नम: ।*
*३१८. ॐ गानपराय नम: ।*
*३१९. ॐ गानप्राणाय नम: ।*
*३२०. ॐ गणाश्रयाय नम: ।*
*३२१. ॐ गानैकभुवे नम: ।*
*३२२. ॐ गानह्रष्टाय नम: ।*
*३२३. ॐ गानचक्षुषे नम: ।*
*३२४. ॐ गणैकदृशे नम: ।*
*३२५. ॐ गानमत्ताय नम: ।*
*३२६. ॐ गानरुचये नम: ।*
*३२७. ॐ गानविदे नम: ।*
*३२८. ॐ गानवित्प्रियाय नम: ।*
*३२९. ॐ गानान्तरात्मने नम: ।*
*३३०. ॐ गानाढ्याय नम: ।*
*३३१. ॐ गानभ्राजत्सभाय नम: ।*
*३३२. ॐ गानमायाय नम: ।*
*३३३. ॐ गानधराय नम: ।*
*३३४. ॐ गानविद्याविशोधकाय नम: ।*
*३३५. ॐ गानाहितघ्नाय नम: ।*
*३३६. ॐ गानेन्द्राय नम: ।*
*३३७. ॐ गानलीनाय नम: ।*
*३३८. ॐ गतिप्रियाय नम: ।*
*३३९. ॐ गानाधीशाय नम: ।*
*३४०. ॐ गानलयाय नम: ।*
*३४१. ॐ गानाधाराय नम: ।*
*३४२. ॐ गतीश्वराय नम: ।*
*३४३. ॐ गानवन्मानदाय नम: ।*
*३४४. ॐ गानभूतये नम: ।*
*३४५. ॐ गानैकभुतिमते नम: ।*
*३४६. ॐ गानतानतताय नम: ।*
*३४७. ॐ गानतानदानविमोहिताय नम: ।*
*३४८. ॐ गुरवे नम: ।*
*३४९. ॐ गुरूदरश्रोणये नम: ।*
*३५०. ॐ गुरुतत्त्वार्थदर्शनाय नम: ।*
*३५१. ॐ गुरुस्तुताय नम: ।*
*३५२. ॐ गुरुगुणाय नम: ।*
*३५३. ॐ गुरुमायाय नम: ।*
*३५४. ॐ गुरुप्रियाय नम: ।*
*३५५. ॐ गुरुकीर्तये नम: ।*
*३५६. ॐ गुरुभुजाय नम: ।*
*३५७. ॐ गुरुवक्षसे नम: ।*
*३५८. ॐ गुरुप्रभाय नम: ।*
*३५९. ॐ गुरुलक्षणसम्पन्नाय नम: ।*
*३६०. ॐ गुरुद्रोहपराङमुखाय नम: ।*
*३६१. ॐ गुरुविद्याय नम: ।*
*३६२. ॐ गुरुप्राणाय नम: ।*
*३६३. ॐ गुरुबाहुबलोच्छ्रयाय नम: ।*
*३६४. ॐ गुरुदैत्यप्राणहराय नम: ।*
*३६५. ॐ गुरुदैत्यापहारकाय नम: ।*
*३६६. ॐ गुरुगर्वहराय नम: ।*
*३६७. ॐ गुह्यप्रवराय नम: ।*
*३६८. ॐ गुरुदर्पघ्ने नम: ।*
*३६९. ॐ गुरुगौरवदायिने नम: ।*
*३७०. ॐ गुरुभीत्यपहारकाय नम: ।*
*३७१. ॐ गुरुशुण्डाय नम: ।*
*३७२. ॐ गुरुस्कन्धाय नम: ।*
*३७३. ॐ गुरुजङ्घाय नम: ।*
*३७४. ॐ गुरुप्रथाय नम: ।*
*३७५. ॐ गुरुभालाय नम: ।*
*३७६. ॐ गुरुगलाय नम: ।*
*३७७. ॐ गुरुश्रिये नम: ।*
*३७८. ॐ गुरुगर्वनुदे नम: ।*
*३७९. ॐ गुरूरवे नम: ।*
*३८०. ॐ गुरुपीनांसाय नम: ।*
*३८१. ॐ गुरुप्रणयलालसाय नम: ।*
*३८२. ॐ गुरुमुख्याय नम: ।*
*३८३. ॐ गुरुकुलस्थायिने नम: ।*
*३८४. ॐ गुरुगुणाय नम: ।*
*३८५. ॐ गुरुसंशयभेत्त्रे नम: ।*
*३८६. ॐ गुरुमानप्रदायकाय नम: ।*
*३८७. ॐ गुरुधर्मसदाराध्याय नम: ।*
*३८८. ॐ गुरुधर्मनिकेतनाय नम: ।*
*३८९. ॐ गुरुदैत्यकुलच्छेत्त्रे नम: ।*
*३९०. ॐ गुरुसैन्याय नम: ।*
*३९१. ॐ गुरुद्युतये नम: ।*
*३९२. ॐ गुरुधर्माग्रगण्याय नम: ।*
*३९३. ॐ गुरुधर्मधुरन्धराय नम: ।*
*३९४. ॐ गरिष्ठाय नम: ।*
*३९५. ॐ गुरुसंतापशमनाय नम: ।*
*३९६. ॐ गुरुपूजिताय नम: ।*
*३९७. ॐ गुरुधर्मधराय नम: ।*
*३९८. ॐ गौरधर्माधाराय नम: ।*
*३९९. ॐ गदापहाय नम: ।*
*४००. ॐ गुरुशास्त्रविचारज्ञाय नम: ।*
*४०१. ॐ गुरुशास्त्रक्रुतोद्यमाय नम: ।*
*४०२. ॐ गुरुशास्त्रार्थनिलयाय नम: ।*
*४०३. ॐ गुरुशास्त्रालयाय नम: ।*
*४०४. ॐ गुरुमन्त्राय नम: ।*
*४०५. ॐ गुरुश्रेष्ठाय नम: ।*
*४०६. ॐ गुरुमन्त्रफलप्रदाय नम: ।*
*४०७. ॐ गुरुस्त्रीगमनोद्दामप्रायश्चित्तनिवारकाय नम: ।*
*४०८. ॐ गुरुसंसारसुखदाय नम: ।*
*४०९. ॐ गुरुसंसारदु:खभिदे नम: ।*
*४१०. ॐ गुरुश्लाघापराय नम: ।*
*४११. ॐ गौरभानुखण्डावतंसभृते नम: ।*
*४१२. ॐ गुरुप्रसन्नमूर्तये नम: ।*
*४१३. ॐ गुरुशापविमोचकाय नम: ।*
*४१४. ॐ गुरुकान्तये नम: ।*
*४१५. ॐ गुरुमयाय नम: ।*
*४१६. ॐ गुरुशासनपालकाय नम: ।*
*४१७. ॐ गुरुतन्त्राय नम: ।*
*४१८. ॐ गुरुप्रज्ञाय नम: ।*
*४१९. ॐ गुरुभाय नम: ।*
*४२०. ॐ गुरुदैवताय नम: ।*
*४२१. ॐ गुरुविक्रमसंचाराय नम: ।*
*४२२. ॐ गुरुदृशे नम: ।*
*४२३. ॐ गुरुविक्रमाय नम: ।*
*४२४. ॐ गुरुक्रमाय नम: ।*
*४२५. ॐ गुरुप्रेष्ठाय नम: ।*
*४२६. ॐ गुरुपाखण्डखण्डकाय नम: ।*
*४२७. ॐ गुरुगर्जितसम्पूर्णब्रह्माण्डाय नम: ।*
*४२८. ॐ गुरुगर्जिताय नम: ।*
*४२९. ॐ गुरुपुत्रप्रियसखाय नम: ।*
*४३०. ॐ गुरुपुत्रभयापहाय नम: ।*
*४३१. ॐ गुरुपुत्रपरित्रात्रे नम: ।*
*४३२. ॐ गुरुपुत्रवरप्रदाय नम: ।*
*४३३. ॐ गुरुपुत्रार्तिशमनाय नम: ।*
*४३४. ॐ गुरुपुत्राधिनाशनाय नम: ।*
*४३५. ॐ गुरुपुत्रप्राणदात्रे नम: ।*
*४३६. ॐ गुरुभक्तिपरायणाय नम: ।*
*४३७. ॐ गुरुविज्ञानविभवाय नम: ।*
*४३८. ॐ गौरभानुवरप्रदाय नम: ।*
*४३९. ॐ गौरभानुस्तुताय नम: ।*
*४४०. ॐ गौरभानुत्रासापहारकाय नम: ।*
*४४१. ॐ गौरभानुप्रियाय नम: ।*
*४४२. ॐ गौरभानवे नम: ।*
*४४३. ॐ गौरववर्धनाय नम: ।*
*४४४. ॐ गौरभानुपरित्रात्रे नम: ।*
*४४५. ॐ गौरभानुसखाय नम: ।*
*४४६. ॐ गौरभानुप्रभवे नम: ।*
*४४७. ॐ गौरभानुभीतिप्रणाशनाय नम: ।*
*४४८. ॐ गौरीतेज:समुत्पन्नाय नम: ।*
*४४९. ॐ गौरीह्रदयनन्दनाय नम: ।*
*४५०. ॐ गौरीस्तनन्धयाय नम: ।*
*४५१. ॐ गौरीमनोवाञ्छित्तसिद्धिकृते नम: ।*
*४५२. ॐ गौराय नम: ।*
*४५३. ॐ गौरगुणाय नम: ।*
*४५४. ॐ गौरप्रकाशाय नम: ।*
*४५५. ॐ गौरभैरवाय नम: ।*
*४५६. ॐ गौरीशनन्दनाय नम: ।*
*४५७. ॐ गौरीप्रियपुत्राय नम: ।*
*४५८. ॐ गदाधराय नम: ।*
*४५९. ॐ गौरीवरप्रदाय नम: ।*
*४६०. ॐ गौरीप्रणयाय नम: ।*
*४६१. ॐ गौरसच्छवये नम: ।*
*४६२. ॐ गौरीगणेश्वराय नम: ।*
*४६३. ॐ गौरीप्रवणाय नम: ।*
*४६४. ॐ गौरभावनाय नम: ।*
*४६५. ॐ गौरात्मने नम: ।*
*४६६. ॐ गौरकीर्तये नम: ।*
*४६७. ॐ गौरभावाय नम: ।*
*४६८. ॐ गरिष्ठदृशे नम: ।*
*४६९. ॐ गौतमाय नम: ।*
*४७०. ॐ गौतमीनाथाय नम: ।*
*४७१. ॐ गौतमीप्राणवल्लभाय नम: ।*
*४७२. ॐ गौतमाभीष्टवरदाय नम: ।*
*४७३. ॐ गौतमाभयदायकाय नम: ।*
*४७४. ॐ गौतमप्रणयप्रह्वाय नम: ।*
*४७५. ॐ गौतमाश्रमदु:खघ्ने नम: ।*
*४७६. ॐ गौतमीतीरसंचारिणे नम: ।*
*४७७. ॐ गौतमीतीर्थनायकाय नम: ।*
*४७८. ॐ गौतमापत्परिहराय नम: ।*
*४७९. ॐ गौतमाधिविनाशनाय नम: ।*
*४८०. ॐ गोपतये नम: ।*
*४८१. ॐ गोधनाय नम: ।*
*४८२. ॐ गोपाय नम: ।*
*४८३. ॐ गोपालप्रियदर्शनाय नम: ।*
*४८४. ॐ गोपालाय नम: ।*
*४८५. ॐ गोगणाधीशाय नम: ।*
*४८६. ॐ गोकश्मलनिवर्तकाय नम: ।*
*४८७. ॐ गोसहस्राय नम: ।*
*४८८. ॐ गोपवराय नम: ।*
*४८९. ॐ गोपगोपीसुखावहाय नम: ।*
*४९०. ॐ गोवर्धनाय नम: ।*
*४९१. ॐ गोपगोपाय नम: ।*
*४९२. ॐ गोपाय नम: ।*
*४९३. ॐ गोकुलवर्धनाय नम: ।*
*४९४. ॐ गोचराय नम: ।*
*४९५. ॐ गोचराध्यक्षाय नम: ।*
*४९६. ॐ गोचरप्रीतिवृद्धिकृते नम: ।*
*४९७. ॐ गोमिने नम: ।*
*४९८. ॐ गोकष्टसंत्रात्रे नम: ।*
*४९९. ॐ गोसंतापनिवर्तकाय नम: ।*
*५००. ॐ गोष्ठाय नम: ।*
*५०१. ॐ गोष्ठाश्रयाय नम: ।*
*५०२. ॐ गोष्ठपतये नम: ।*
*५०३. ॐ गोधनवर्धनाय नम: ।*
*५०४. ॐ गोष्ठप्रियाय नम: ।*
*५०५. ॐ गोष्ठमयाय नम: ।*
*५०६. ॐ गोष्ठामयनिवर्तकाय नम: ।*
*५०७. ॐ गोलोकाय नम: ।*
*५०८. ॐ गोलकाय नम: ।*
*५०९. ॐ गोभृते नम: ।*
*५१०. ॐ गोभर्त्रे नम: ।*
*५११. ॐ गोसुखावहाय नम: ।*
*५१२. ॐ गुदुहे नम: ।*
*५१३. ॐ गोधुग्गणप्रेष्ठाय नम: ।*
*५१४. ॐ गोदोग्धे नम: ।*
*५१५. ॐ गोमयप्रियाय नम: ।*
*५१६. ॐ गोत्राय नम: ।*
*५१७. ॐ गोत्रपतये नम: ।*
*५१८. ॐ गोत्रप्रभवे नम: ।*
*५१९. ॐ गोत्रभयापहाय नम: ।*
*५२०. ॐ गोत्रवृद्धिकराय नम: ।*
*५२१. ॐ गोत्रप्रियाय नम: ।*
*५२२. ॐ गोत्रार्तिनाशनाय नम: ।*
*५२३. ॐ गोत्रोद्धारपराय नम: ।*
*५२४. ॐ गोत्रप्रवराय नम: ।*
*५२५. ॐ गोत्रदैवताय नम: ।*
*५२६. ॐ गोत्रविख्यातनाम्ने नम: ।*
*५२७. ॐ गोत्रिणे नम: ।*
*५२८. ॐ गोत्रप्रपालकाय नम: ।*
*५२९. ॐ गोत्रसेतवे नम: ।*
*५३०. ॐ गोत्रकेतवे नम: ।*
*५३१. ॐ गोत्रहेतवे नम: ।*
*५३२. ॐ गतक्लमाय नम: ।*
*५३३. ॐ गोत्रत्राणकराय नम: ।*
*५३४. ॐ गोत्रपतये नम: ।*
*५३५. ॐ गोत्रेशपूजिताय नम: ।*
*५३६. ॐ गोत्रभिदे नम: ।*
*५३७. ॐ गोत्रभीत्त्रात्रे नम: ।*
*५३८. ॐ गोत्रभिद्वरदायकाय नम: ।*
*५३९. ॐ गोत्रभित्पूजितपदाय नम: ।*
*५४०. ॐ गोत्रभिच्छत्रुसूदनाय नम: ।*
*५४१. ॐ गोत्रभित्प्रीतिदाय नम: ।*
*५४२. ॐ गोत्रभिदे नम: ।*
*५४३. ॐ गोत्रपालकाय नम: ।*
*५४४. ॐ गोत्रभिद्गीतचरिताय नम: ।*
*५४५. ॐ गोत्रभिद्राज्यरक्षकाय नम: ।*
*५४६. ॐ गोत्रभिज्जयदायिने नम: ।*
*५४७. ॐ गोत्रभित्प्रणयाय नम: ।*
*५४८. ॐ गोत्रभिद्भयसम्भेत्त्रे नम: ।*
*५४९. ॐ गोत्रभिन्मानदायकाय नम: ।*
*५५०. ॐ गोत्रभिद्गोपनपराय नम: ।*
*५५१. ॐ गोत्रभित्सैन्यनायकाय नम: ।*
*५५२. ॐ गोत्राधिपप्रियाय नम: ।*
*५५३. ॐ गोत्रपुत्रीपुत्राय नम: ।*
*५५४. ॐ गिरिप्रियाय नम: ।*
*५५५. ॐ ग्रन्थज्ञाय नम: ।*
*५५६. ॐ ग्रन्थकृते नम: ।*
*५५७. ॐ ग्रन्थग्रन्थिभिदे नम: ।*
*५५८. ॐ ग्रन्थविघ्नघ्ने नम: ।*
*५५९. ॐ ग्रन्थादये नम: ।*
*५६०. ॐ ग्रन्थसंचाराय नम: ।*
*५६१. ॐ ग्रन्थश्रवणलोलुपाय नम: ।*
*५६२. ॐ ग्रन्थाधीनक्रियाय नम: ।*
*५६३. ॐ ग्रन्थप्रियाय नम: ।*
*५६४. ॐ ग्रन्थार्थतत्त्वविदे नम: ।*
*५६५. ॐ ग्रन्थसंशयसंछेदिने नम: ।*
*५६६. ॐ ग्रन्थवक्त्रे नम: ।*
*५६७. ॐ ग्रहाग्रण्ये नम: ।*
*५६८. ॐ ग्रन्थगीतगुणाय नम: ।*
*५६९. ॐ ग्रन्थगीताय नम: ।*
*५७०. ॐ ग्रन्थादिपूजिताय नम: ।*
*५७१. ॐ ग्रन्थारम्भस्तुताय नम: ।*
*५७२. ॐ ग्रन्थग्राहिणे नम: ।*
*५७३. ॐ ग्रन्थार्थपारदृशे नम: ।*
*५७४. ॐ ग्रन्थदृशे नम: ।*
*५७५. ॐ ग्रन्थविज्ञानाय नम: ।*
*५७६. ॐ ग्रन्थसंदर्भशोधकाय नम: ।*
*५७७. ॐ ग्रन्थकृत्पूजिताय नम: ।*
*५७८. ॐ ग्रन्थकराय नम: ॥*
*🔸गणेश मंत्रांचे महत्त्व.🔸*
*साधनामंत्र...*
*अ. `श्री गणेशाय नम: ।' यातील श्री हा श्रीं आहे व तो बीजमंत्र आहे... गणेशाय ही मूळ बीजाची संकल्पना आहे, तर नम: हे पल्लव आहे.....*
*आ. `ॐ गँ गणपतये नम: ।'*
*अर्थ : ॐ म्हणजे प्रणव, गँ म्हणजे मूळ बीजमंत्र, गणपतये म्हणजे आकृतिबंधाला व नम: म्हणजे नमस्कार करतो.....*
*बीजमंत्र...*
*`गँ' हा गणपतीचा मूळ बीजमंत्र आहे... गणपतीची, म्हणजे पंचमहाभूतांतील तेजप्रवाहांची, उत्पत्ति ज्या तेजसमूहापासून झाली, तो तेजसमूह `गँ' या बीजमंत्रात अंतर्भूत आहे. `गँ'चा उच्चार , ञ, ण, न, म, या पाच अनुनासिकांना एकत्र करून जो उच्चार होईल, त्याप्रमाणे असतो.....*
*मंदाराच्या, म्हणजे पांढर्या रुईच्या झाडापुढे `गँ' ची आवर्तने केल्यास त्या झाडाची एक मुळी वर येते... तिला गणेशाचा आकार असतो. त्याचे कारण याप्रमाणे आहे - `गँ' च्या उच्चाराने त्याची स्पंदने (शक्ति) वातावरणात निर्माण होतात. त्यांचा झाडाच्या मुळावर परिणाम होतो आणि `शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व त्यांच्याशी संबंधित शक्ति एकत्र असतात', या नियमानुसार शक्तीबरोबर गणेशाच्या रूपाची मुळी वर येते. सात-आठ वर्षांहून जास्त वयाच्या पांढर्या रुईच्या वृक्षाला जमिनीतून मुळासकट बाहेर काढले असता त्याच्या मुळाचा आकार गणपतीप्रमाणे दिसतो.....*
*अंगारकयोग (मंगळवारी संकष्टी चतुर्थी) किंवा रविवारी पुष्य नक्षत्र असेल तेव्हा मंदार च्या सात-आठ वर्षांहून जास्त वयाच्या वृक्षाची षोडशोपचारे पूजा करून अथर्वशीर्षाचा पाठ करावा... साधारणत: चतुर्थीपासून सुरू करून दुसर्या चतुर्थीपर्यंत एक हजार पाठ करावे. नंतर हवन करून प्रत्येकी शंभर मोदक, लाह्या व दूर्वाकुरांची आहुति द्यावी. शेवटी कुणाशी न बोलता व कुणालाही स्पर्श न करता ते झाड मुळापासून उपटून काढावे. त्याचा आकार गणपतीसारखाच असतो. ही संस्कारित मूर्ति घरी स्थापन करावी. ह्या मूर्तीच्या पूजनाने अनेक प्रकारच्या सिद्धी तसेच ऐश्वर्य प्राप्त होते. मूर्तीची दररोज धूप, दीप व नैवेद्य यांसह पूजा करून अथर्वशीर्षाचा पाठ म्हणावा. शक्ति संक्रमित होऊन नाहीशी होऊ नये म्हणून बहुधा अशी मूर्ति झाकून ठेवतात.....*
*खार्या पाण्यातील गारगोटीवर `गँ' मंत्राचा कमीतकमी वर्षभर उच्चार केल्यास गारगोटीचा आकार गणपतीसारखा होतो.....*
*स्त्रोत: आंतरजाल...*
*🔸बलराम.🔸*
*🟣२९/०८/२५- बलराम जयंती...🙏*
*बलराम हा वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ होता, सुभद्रा त्याची सख्खी बहीण... बलरामाला बलभद्र, हलधर, हलायुध, इत्यादी अनेक नावे आहेत संकर्षण आदी नावे असून, अनंतशेषाचा अवतार आहे पांचरात्र शास्त्रानुसार बलराम (बलभद्र) वासुदेवाचे स्वरूप आहे; ‘नारायणीयोपाख्यात’ मध्ये वर्णन केलेल्या तत्वज्ञानानुसार विष्णूचे चार रूपांतील 'चतुर्व्यूह' दुसरे रूप म्हणजे ‘संकर्षण.' उत्तरभारत हिंदी भाषेत 'बलदाऊ' म्हणतात. नांगर हे बलरामाचे हत्यार असून ते खांद्यावर घेऊन तो हिंडत असतो.....*
*बलरामाची पत्नी रेवती आहे... घटनाक्रम सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंतचा आहे. ज्यामध्ये काळचक्र भेद सांगितला आहे. सतयुगात महाराजा रैवतक हे पृथ्वीचा सम्राट होते, ज्याच्या मुलीचे नाव राजकन्या रेवती होते. महाराजा रैवतकने आपल्या मुलीला सर्व प्रकारचे शिक्षण दिले. जेव्हा रेवतीची तारुण्यता झाली, तेव्हा तिचे वडील रैवतक यांनी लग्नासाठी पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट वराचा शोध सुरू केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेवतीसाठी संपूर्ण पृथ्वीवर कोणालाही वर सापडला नाही, ज्यामुळे महाराजा रैवतक निराश झाला.....*
*नंतर महाराज रैवतकने आपली कन्या रेवतीसाठी वराच्या शोधात ब्रह्मलोकात जाण्याचे ठरवले... महाराज रैवतक आपली मुलगी रेवतीसमवेत ब्रह्मलोकास गेले. ब्रह्मदेवाने सांगितल्या प्रमाणे, त्यानंतर बरेच युग निघून गेले. यावेळी द्वापरयुग पृथ्वीवर आहे, आणि भगवान विष्णू स्वतः कृष्ण म्हणून अवतरले आहेत. आणि त्याचा भाऊ बलराम जो शेषनागचा अवतार आहे.....*
*रेवती २१ फूट उंच होती आणि बलरामाने तिला नांगराच्या टोकाने दाबून, रेवतीला लहान केले, असे पाहून महाराज रैवतकला आश्चर्य वाटले... महाराज रैवतक खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी रेवती आणि बलराम यांच्या लग्नास मान्यता दिली.असे सांगितले जाते.....*
*बलरामचा जन्म...*
*श्रीविष्णु यांनी योगमायापासून देवकीच्या सातव्या गर्भातुन रोहिणीच्या गर्भाशयात ठेवले... क्रूर कंसाने वासुदेव-देवकीला तुरूंगात बंद केले तेव्हा रोहिणी अस्वस्थ झाली; पण पती-सेवेसाठी रोहिणी तुरूंगात जाण्याची परवानगी मिळाली. ती तिथे जायची. यामुळे वासुदेवाचे दुःख बरेच कमी झाले. त्याच वेळी देवकीमध्ये जेव्हा सातवा गर्भ उघडकीस आला, तेव्हा त्याचवेळी गर्भाची लक्षणे एकाच वेळी दिसू लागली. वासुदेवला काळजी होती की, ज्याप्रमाणे कंसाने देवकीच्या ६ मुलांना ठार मारले गेलं त्याचप्रमाणे रोहिणीच्या मुलालाही संशयास्पदरीतीने ठार मारले जाऊ नये. या भीतीने त्याने रोहिणीला आपला भाऊ ब्रजराज नंदगोप यांच्याकडे गुप्तपणे पाठवले आणि रोहिणीला यशोदा नंदाने रोहिणीला आपला गृहात राहायला दिले.....*
*मग तिला तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणा झाली... ब्रजपुर येथे येऊन चार महिने योगमायाने आधीच गर्भाशयात गर्भ धारण केले होते आणि तेथून देवकीचा सातवा गर्भ, रोहिणीमध्ये गर्भाशयात ठेवले. अशा प्रकारे रोहिणीला बलारामाची आई होण्याचे अंतिम भाग्य प्राप्त झाले. योगमाया नंतर, गर्भधारणेच्या सात महिन्यांनंतर - गर्भधारणेच्या चौदा महिन्यांनंतर, रोहिणीने श्रीकृष्णाच्या जन्माच्या आठ दिवस आधी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी, अनन्तरूप बलराम रोहिणीच्या गर्भाशयातून उत्पन्न झाले.....*
*बलराम लहानपणापासूनच अत्यंत गंभीर आणि शांत होता... तो उत्तम कुस्तीपटू तर होताच शिवाय मुष्टियुद्धात तरबेज होता. कंसाच्या तालमीमध्ये कृष्णाने चाणूराला मारले, तर बलरामाने मुष्टिकाला ठोसे मारून ठार केले. महाभारत युद्धप्रसंगी बलराम तटस्थ होता. युद्ध सुरू होण्यापूर्वीच तो तीर्थयात्रेला गेला.....*
*आपआपसातील यादवीमुळे यदुवंशाचा नाश झाल्यानंतर बलराम समुद्रकिनारी आसन लावून बसला आणि त्याने आपला अवतार संपवला.....*
*बलरामाला सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी व्हावे असे वाटत होते, पण श्रीकृष्णाने बलरामाला चकवून, सुभद्रेला (चित्रा) लग्नमंडपातून पळवून आणण्यास अर्जुनाला मदत केली, आणि त्या दोघांचे लग्न लावून दिले.....*
*आंतरजाल...*
*🔸 श्री गणेश महिमा.🔸*
*गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे... एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात.....*
*गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे... एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते.....*
*हिंदूंमध्ये जे अनेक उपासना पंथ निर्माण झाले त्यामध्ये ' गाणपत्य ' हा एक पंथ आहे... गाणपत्याचे दैवत आहे गणपती. पार्वतीच्या अंगाच्या मळापासून गणपती निर्माण झाला अशी एक दंतकथा आहे. त्याप्रमाणे व्यासांनी सांगितलेलं महाभारत गणपतीने लिहिलं अशी समजूत आहे. अंगाने स्थूल , किंचित पिवळट वर्णाचा , मोठ्या पोटाचा , चार हात असलेला व एकदंत , हत्तीचं डोकंअसलेला , असं गणपतीचं रूप पुराणात वर्णिले आहे. त्याने आपल्या चारही हातात शंख , चक्र , गदा व पद्म ही आयुधं धारण केली आहेत.....*
*कधीकधी उंदराला आपलं वाहन करून त्यावर बसून चालला आहे , असंही गणपतीचं वर्णन आढळतं... गणपतीला हत्तीचं मस्तक का लागलं याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत.....*
*शनीच्या कटाक्षापासून होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून पार्वतीने एकदा शनीला गणपतीकडे बघण्यास सांगितलं... कारण तिला आपल्या पुत्राचा फार अभिमान होता. शनीने गणपतीकडे दृष्टी फिरवताच गणपतींचं मस्तक जळून खाक झालं तेव्हा पार्वतीला अतिशय दु:ख होऊन तिने ब्रह्मादेवास ही हकीकत कथन केली. ब्रह्मादेवाने तिला सांगितलं की तुला पहिल्या प्रथम ज्या प्राण्याचं मस्तक मिळेल ते मस्तक धडाला लाव म्हणजे गणपती पूर्ववत होईल. ब्रह्मादेवाच्या सांगण्याप्रमाणे ती मस्तकाच्या शोधात निघते. प्रथम तिला हत्तीचं मस्तक मिळतं. याप्रमाणे गणपती ' गजवदन ' झाल्याची एक दंतकथा आहे.....*
*दुसरी एक दंतकथा अशी आहे की पार्वती स्नानास बसली असता तिने गणपतीला दरवाजावर राखण करण्याची आज्ञा देते... त्याप्रमाणे गणपती दरवाजाजवळ बसून राहतो. तेवढ्यात शंकर तिथे येतात. परंतु त्यांना आत जाण्यास गणपतीने प्रतिबंध केल्यामुळे ते गणपतीचं शिर उडवतात. त्यामुळे पार्वतीला फार दु:ख होतं. तिचं सांत्वन करण्यासाठी शंकर त्याच्या धडावर हस्तीचं मस्तक बसवून गणपतीला सजीव करतात.....*
*एकदा परशुराम शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात... त्यावेळी शंकर निदिस्त असतात. तेव्हा परशुरामाला अंतर्गृहात येण्यास गणपती मज्जाव करतो. त्या दोघांमध्ये बाचाबाची होऊन युद्ध जुंपतं. गणपती परशुरामाला आपल्या सोंडेत धरून गरगर फिरवताच त्याला मूर्च्छा येते. सावध झाल्यानंतर परशुराम आपला परशू गणपतीवर फेकतात. (शंकरानेच तो परशू परशुरामाला दिलेला असतो. त्यामुळे गणपतीने आदराने तो आपल्या एका दातावर धारण करतो. पण त्यामुळे त्याला तो दात गमावावा लागतो. म्हणूनच गणपतीला ' एकदंत ' किंवा ' एकदंष्ट ' असं म्हणतात.....*
*इतर देवतांप्रमाणे गणपतींची उपासना करणारा एक संप्रादाय भारतात आहे... या संप्रदायाला ' गाणपत्य ' असं म्हणतात. हाच परमात्मा असून त्यानेच सर्व ब्रह्मांड निर्माण केलं असं या पंथाचे अनुयायी मानतात. या पंथाच्या आचार्यांनी निरनिराळे ग्रंथ लिहिले. हे सर्व ग्रंथ त्या पंथाच्या अनुयायांनी प्रमाण मानले आहेत. या संपादायाचे प्रमुख ग्रंथ वस्दतापलीय अगर गणपति तापनीय उपनिषद , गणेश पुराण , मुगदल पुराण व ब्रह्मावैवर्त पुराणाचा गणेश खंड असे आहेत. ' गणेश संहिते ' त अगर ' गणपत्यनिषदा ' त गणपती व ग्रहण हे एक असून गणपती हा जगताचा आदीकारण होय असं सांगितलं आहे. गणेश खंडामध्येदेखील अशाच कथा आहेत.....*
*ब्रह्मावैवर्त पुराणामध्ये एका अध्यायात राधा गणेशाची पूजा करत असे, असं सांगितलं आहे... हे ध्यानात ठेवण्यासारखं आहे. गणेश खंडामध्येदेखील अशाच कथा आहेत. गणेश खंडात शिवाने गणपतीला प्रसन्न करून घेण्यासाठी दहा वर्षं घोर तपश्चर्या केली व त्यापासून त्रिपुरासुराचा वधाचा वर प्राप्त करून घेतला असं वर्णन आलेलं आहे.....*
*गणेश गीता नावाचाही एक ग्रंथ आहे. पण तो जवळजवळ भगवद्गीतेसारखाच आहे... फक्त ' कृष्णाऐवजी गणेश ' नाव घालण्यात आलं आहे याखेरीज ' गणपती कवच ', ' गणपती पंचरत्न ', ' गणपति पंचांग ', ' गणपति पंचावरण स्तोत्र ' ( शंकराचार्यकृत) , ' गणपतीपुराश्चरणाविधी ', ' गणपति पूजा ', ' गणपती पंत्र विधान ', ' गणपति मानसपूजा ', ' गणपति रत्नप्रदीप ', ' गणपति रहस्य ', ' गणपति सूक्त ', ' गणपति स्तवराज ', ' गणेश महात्म ' इत्यादी अनेक गणेश पूजनाचे ग्रंथ आहेत.....*
*आनंदतीर्थांनी लिहिलेल्या ' शंकर दिग्विजया ' मध्ये भया गणपत्यासंबंधीचा व त्यांच्या तत्त्वांचा उल्लेख आला आहे... हा ग्रंथ दहाव्या शतकांमध्ये लिहिला गेला असावा. या ग्रंथामध्ये गाणपत्यांचे सहा पोटभेद होते. हे पोटभेद म्हणजे ' महागणपति पंथ ', ' हरिदागणपति पंथ ', ' उच्छिद गणपति पंथ ', ' नवनीत गणपति पंथ ', ' स्वर्गगणपति पंथ ' व ' सनातन गणपति पंथ ' हे आहेत.....*
*या पंथांपैकी ' उच्छिष्टा गणपति पंथ ' थोडासा चमत्कारिक आहे... या पंथाचे अनुयायी गणपतीची डाव्या हाताने पूजा करतात. हे लोक गणपतीला ' ऐरंब ' हे नाव देतात. या पंथात जातीभेद पाळण्यात येत नाही. सर्व विवाहविषयक निबंधिंना या पंथात थारा नाही. चंदकृति तांबडे गंध लावणे ही गाणपत्यांची मुख्य खूण होय.....*
*भादपद शुद्ध चतुर्थीस (गणेश जन्मदिवसापासून) या सणाला आरंभ होतो... गणेशदेवता व शेतीचा हंगाम यांचा अन्योन्य संबंध असावा. कारण पावसाला उशीर झाल्यामुळे आगामी पीकपाण्याबद्दल अनिश्चितता वाटू लागल्यावर ' विघ्नहर्ता ' गणेशाचं पूजन करणं हे प्रसंगोचित व जरूरी आहे.....*
*' व्रतराज ' ग्रंथात या व्रताचा उल्लेख येते. भादपद शुद्ध चतुथीर्स गणेशाची सुवर्णाची मूर्तीकरून तिची प्राणप्रतिष्ठेपासून पूजा करून हवनादि विधी करावे व नंतर ती मूर्ती ब्राह्माणास दान करावी इत्यादी विधी सांगितला आहे.....*
*विनायकी व संकष्टी चतुर्थी या व्रतांचा संबंध चंदाकडे नसून, गणेशाकडेच आहे... परंतु गणेश व चंद यांचाही अन्योन्य संबंध आहे, ही गोष्ट गणेशचतुर्थीस दिसून येते. कारण त्या दिवशी चंद पाहणं अशुभ मानतात. कोणी चुकून चंद पाहिलाच तर त्याला शेजारच्या घरावर दगड फेकून व चार शिव्या खाऊन ते अशुभ टाळता येतं. चतुर्थीचा चंद पाहणं व विपद्ग्रस्त होणं या गोष्टी मराठीत समानार्थी मानल्या जातात.....*
*पेशव्यांच्या राजवाड्यात प्रतिवर्षी भादपद शुद्ध चतुर्थी ते दशमीपर्यंत गणेशोत्सव होत असे... त्याप्रसंगी गणपती रंग महालात मोठी आरास केली जाई. सर्व कार्यक्रम तिथेच होत. स्वच्छ हंडे, झुंबरे, मोठाले आरसे व विविध चित्रं यामुळे त्या महालाचं सौंदर्य द्विगुणित होत असे. मध्यावर सोन्याच्या भरजरीचं काम जिच्यावर केलं आहे अशी पेशव्यांची ' मनसद ' उर्फ गादी मांडलेली असे. दोन्ही बाजूला मुख्य मराठे सरदार, शिलेदार व दरबारी हे भरजरी पोशाख घालून आपापल्या दर्जाप्रमाणे रांगेने बसलेले असत. भालदार, चोपदार यांच्या ललकारीत स्वारी दरबारात प्रवेश करून मोठ्या ऐटीने सिंहासनारूढ होत असे. गणपती रंग महालात त्यावेळी गाणं, नाच, कथा-कीर्तनं वगैरे कार्यक्रम होत.....*
*या उत्सवात सर्व नोकर- चाकर मोठ्या हौसेने मिसळत... त्यांना पेशव्यांकडून मिठाई वाटण्यात येई. ब्राह्माणभोजनं बरीच होत. विसर्जनाच्या दिवशी पुष्पांनी शृंगारलेल्या पालखीतून थाटाची मिरवणूक काढून गणपती विसर्जन होई. त्यावेळी पेशवे जातीने हजर असत.....*
*गणपती उपासनेचं महात्म्य महाराष्ट्रात व दक्षिण भारतात आढळून येते... दविड लोकांचा हा मूळचा देव असावा. या देवाचं वाहन उंदीर आहे. दविड लोकांची ' औरौन ' म्हणून जी एक जात आहे त्या जातीचे उंदीर हे प्रमुख दैवत आहे. श्रावणकोरमध्ये ' होमपुरे ' उर्फ गणपतीची देवळं पुष्कळ ठिकाणी असून त्या ठिकाणी दररोज होम केला जातो. काही ठिकाणी क्वचित प्रसंगी ' महागणपति होम ' नावाचा खर्चिक होमही करण्यात येतो.....*
*पुण्याजवळ चिंचवडला गणपतीची स्वयंभू मूर्ती असून त्या ठिकाणी मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मोठा उत्सव करण्यात येतो... इथल्या मोरया गोसावी नावाच्या साधूने गणपतीला प्रसन्न करून घेतले. ' मी तुझ्या शरीरात व तुझ्यामागून होणाऱ्या सहा पुरुषांत अंश रूपाने वास करेन ,' असा गणपतीने त्याला वर दिला. त्याप्रमाणे मोरया व त्याचे सहा वंशज यांच्यामध्ये गणपती वास करतो , अशी समजूत असून या सात जणांच्या समाधीची गणपती या नात्याने दररोज पूजा करण्यात येते. या गणपती संस्थानला अनेक भाविकांनी देणग्या दिल्या असून , खुद्द औरंगजेब बादशहानेदेखील त्या संस्थानला आठ खेडी इनाम दिल्याचा उल्लेख आढळतो.....*
*स्रोत: आंतरजाल, डॉ. वसंत ज. डोळस, महाराष्ट्र टाईम्स...*
*🔸श्रीगणेश स्तुति.🔸*
*ॐ श्री गणेशाय नम: |*
*ॐ नमो जी श्रीगणेशा । आद्य वन्द्य तु सुरवरेश्वरा । ॐकार_शुण्डा, शूर्प_कर्णा । ब्रह्माण्ड_उदरा, लम्बोदरा... (१)*
*उत्पत्ति, स्थिति, लय कधी ? कसा ?। का ? कुणाचा ? या गणितांच्या । 'समीकरण'रूपी तव 'पाशा'। हस्ती धरुनी क्रीडसी मोदे... (२)*
*तव सु'स्वरूप', लीलादिका । वर्णावे ऐशी मम इच्छा । पूर्ण करावी हीच प्रार्थना । तव चरणी मी करीतसे ...(३)*
*तव लीला_'अवतार' कथा । व्रते, पूजा विधि विधाना । गणेश, मुद्गल पुराणी वर्णिल्या । व्यासावतारी नारायणाने... (४)*
*त्यातील काही वेचक माहिती । 'मराठी' भाषेत करण्यास 'उक्ति' । द्यावी मजला बौद्धिक शक्ति । ऐशी विनवणी तव चरणी ...(५)*
*'कृत'युगी अदिति-कश्यप पुत्र । अवतरलास तु 'महोत्कट' । मारावयास नरांतक देवांतक । लीला विनोदे मांडिली... (६)*
*'त्रेता' युगी तु गिरिजात्मज । नामे 'गुणेश', 'मयूरेश्वर' । मारिलास 'सिंधु' दैत्येश्वर । भक्त संरक्षणाप्रीत्यर्थ ... (७)*
*'द्वापर' युगी ब्रह्मदेवे । देता जांभई 'सिन्दूर' उद्भवे । वरेण्य पुत्र 'गजानन' रूपे । चिरडून 'सिन्दूर'_वर्ण तव झाला ...(८)*
*'कलि' युगी तु युगांत समयी । 'धर्म' पुन: प्रस्थापण्यासी। 'धुम्रकेतु' नामावतारी। प्रगट होशील भविष्यात ...(९)*
*अवस्थेतली चतुर्थावस्था । जिला नाम 'तुरीया' वा 'तुर्या' । तीच स्वानंदे 'सहज' साध्य होता । तव सालोक्य मुक्तिचा लाभ... (१०)*
*चारही पुरुषार्थाञ्चा दाता । चारही सं_कष्टांचा हर्ता । विघ्न कर्ता धर्ता हर्ता । अनाकलनीय या तुझ्या लीला ...(११)*
*तुझे चतुर्थी तिथी_व्रत । शुक्ल, कृष्ण दोनही पक्षांत । 'विनायकी', 'संकष्टी' नामे प्रसिद्ध । प्रिय सर्व गाणेश भक्तासी... (१२)*
*शुक्ल पक्षात चंद्रोदय । दिवसा सूर्योदयानंतर । मेळविण्यास चारही पुरुषार्थ । ज्ञान_सूर्य उजेडात मानसीच्या ...(१३)*
*कृष्ण पक्षात चंद्रोदय । रात्री सूर्यास्ता नंतर । रात्री अंधार अज्ञान तिमिर । त्यावरी सं_कष्टांचा मारा ...(१४)*
*जेथे मानवी शक्ती, युक्ती । अपुरी पडे ऐशिया समयी । गणेशा तुझी कृपा दैवी । मागावया संकष्टी व्रताचरण... (१५)*
*गणेशा तुझी आद्य वंदना । मान्य सर्व वैदिक जना । शैव, शाक्त, सौर, वैष्णवा । 'गाणेश' तर तुझेच अनुयायी... (१६)*
*अवैदिक बौद्ध, जैन, शीख । वीरशैवादिक पंथ अनंत । तेही तुला मानिती अत्यंत । सर्वमान्य तु जगद्वंद्या... (१७)*
*वार_व्रत तव मंगळवारी । भौम, भूमिपुत्र ग्रहाचे वारी । येता 'चतुर्थी' त्याच वारी । 'अंगारकी' योग तव वरदाने... (१८)*
*ऐशी 'अंगारकी' विनायकी । तैशीच 'अंगारकी' "संकष्ट_चतुर्थी" । जे जे भक्तीने आचरिती । 'पुण्यार्जन' त्यांस अधिक होई ...(१८)*
*व्रताचरणार्थ 'उपवास'। पूजा, अर्चना करुनी 'विशेष' । गाती जे तुझी स्तोत्रे सतत । त्यांवरी 'प्रसन्न' होसी तु... (१९)*
*अदिती, पार्वती, लक्ष्मी देवीन्नी । ऐसेच तुजसी सुप्रसन्न करुनी । 'वरदानार्थ' तव मातृत्व मागुनी । अवतार तुजसी घडविले... (२०)*
*अदितीपुत्र 'महोत्कट'। पार्वतीपुत्र 'गिरिजात्मज' । लक्ष्मीपुत्र 'ढुंढिराज'। अवतार तुझे ऐसे नाना ...(२१)*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸गणपती का बसवतात?🔸*
*🔸एक मतप्रवाह.🔸*
*आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते, म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिन्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालेल आणि त्या मुळे गणपतीला थकवा येईल, आणि पाणिही वर्ज्य होते, अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणपतीची यथा सांग पूजा केली.*
*माती चे लेपन केले, म्हणून गणपती अकडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकड़े पाहिले असता, त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे, आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात बसवले. या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. या काळात गणपतीला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवताे.*
*श्रीगणराया मुर्ती कशी असावी?*
*गणेशमूर्ती शाडू माती असावी. तसेच ती ९ ते ११ इंचच उंचीची असावी. त्याचप्रमाणे ही गणेशमूर्ती निवडतानासुद्धा अथर्वशीर्षांत वर्णिलेल्या गणेशासारखीच असावी.*
*एकदन्तं चतुर्हस्तम् पाशमं कुशधारिणम् ॥*
*रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् । रक्तम् लम्बोदरं शूर्पकर्णकं।।*
*म्हणजेच- एकदन्तम्- एक दात असलेला, चतुर्हस्तम्- चार हात असलेला, पाशमंकुश धारिणम्- पाश व अंकुश ही दोन शस्त्रे दोन हातांत धारण केलेला, व उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हाताने प्रसादमुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारा, मोठे सुपासारखे कान, लंबोदर, मूषकासहित अथवा मूषकावर स्वार असणारा, अशी गणेशमूर्ती असावी.*
*गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी?*
*पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.*
*घरच्या प्रमुख व्यक्तीने (शक्यतो बिना चप्पल घालत) गणेशमूर्ती आणावी. त्याकरिता घरातून निघतानांच एक तबक, गुलाल व नवीन मोठा रुमाल घेऊनच निघावे. त्यानंतर वरती वर्णिल्याप्रमाणे गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर थोडासा गुलाल उधळावा व ‘मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करीत, आणलेल्या तबकात मूर्ती घ्यावी व त्यावर रुमाल झाकावा व मुलाबाळांसहित अत्यंत आनंदाने ‘श्रीं’सह घरी यावे.*
*घरी आल्यानंतर दरवाजातच थांबावे. घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी त्या मूर्तीवरून ओवाळून बाहेर ठेवावी व श्रीगणरायाची सोन्याने देवाचे औक्षण करावे व पतीच्या, मुलांच्या कपाळाला गुलाल लावून ‘गणेशा आपले सहर्ष आगमन असो’, असे म्हणून टाळ्यांच्या कडकडाटात श्रींना घरात घ्यावे.*
*ज्या जागी स्थापना करायची, त्या जागेवर थोडय़ाशा अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी. विशेष नोंद करावी की, कृपया श्रीगणरायाच्या मुर्तीचे मोल हे अनमोल आहे. जी मुर्ती आपणास आवडेल, ती मुर्ती आपण घ्यावी देवाची मुर्तीची किंमत (भाव) कृपया करू नये.....*
*(संकलित.)*
*उजव्या सोंडेच्या गणपती विषयी निरनिराळे समज - गैरसमज प्रचलित आहेत. शास्त्रात याविषयी काही नियम वा संकेत आहेत काय..?*
*उजव्या सोंडेच्या गणपती विषयीचे लिखाण एकत्र केले तर एक ग्रंथ तयार होईल... पण कोणत्याही धर्मशास्त्रीय ग्रंथात त्याविषयी फारसा उहापोह केलेला आढळत नाही.....*
*गणेशाच्या निरनिराळ्या ध्यानांमध्येही तसा स्पष्ट उल्लेख आढळत नाही... पण काही वृध्द, जाणकार व नि:सीम गणेशभक्तांनी दिलेल्या माहीतीवर अवलंबून रहावे लागते. गणेशपंथी साधक गणपती देवतेचा अतिसूक्ष्म विचार करताना आढळतात. त्यांच्या मते पार्वतीने तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार होय. तिने मृत्तिकेचा आकार करून त्यात महागणपतीचे आवाहन केले. जगदुत्पत्ती होण्यापूर्वी निर्गुण व कुटस्थ स्वरूपात असलेल्या महत्वास ते महागणपती म्हणतात. त्यानेच विविध प्रसंगी विविध प्रकारचे अवतार घेऊन दुष्टांचा संहार व सुष्टांचा प्रतिपाळ केला. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणेशावतार व इतर सात महागणपती होत असे सांगितले जाते.....*
*महागणपती जेव्हा विशिष्ट सिध्द किंवा निखळ मोक्षप्राप्ती स्तव आराधिला जातो तेव्हा उजवीकडे सोंड असलेला गणपती घेण्याची प्रथा आहे... पण अशा वेळी तो शक्यतो पार्थिक गणपती असतो. काही सोन्या-चांदीच्या उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्ती क्वचित आढळतात. पण उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमागील कामना उच्चस्तरीय असल्यामुळे कडक सोवळे, घरात अत्यंत पवित्र आहार, दररोज मोदक नैवेद्य इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. पण ही भक्ती बऱ्याच वेळा प्रीतिपोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्यातून अपसमजुती प्रचलित होतात. कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो इत्यादी अंधश्रद्धा त्यातूनच फैलावल्या आहेत.....*
*कडक आचार न पाळल्यास फार तर देवमूर्तीतील देवत्व कमी होईल, पण तथाकथित अतिरंजित परिणाम होणार नाहीत... कारण तसा शास्त्राधारही नाही व अनुभवही नाही. ज्या घरात उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आहे, तेथे काही उपद्रव असतीलच तर त्यामागे कारणेही तशीच निरनिराळी असतात. त्यासाठी गणपतीला जबाबदार धरण्यात काहीच अर्थ नसतो.....*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
*मनःशांती*
एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते.
विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे?
सस्मित चेहर्याने विष्णूंनी उत्तर दिले, 'तू अजिबात चिंता करू नकोस. मजजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.'
लक्ष्मीने विचारले, 'सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.' विष्णू म्हणाले, 'तिचं नाव आहे शांती' जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे.
भाग १.
सुमारे पांच सात हजार वर्षापुर्वी पाताळातील रत्नपुरीत काशीराजाचे राज्य होते. विद्वान कश्यपत्रृषी व पत्नि आदिती हिमालयाच्या पायथ्याशी राहत. त्यांच्या गुरुकुलात २१०० बटु शिक्षण घेत होते. ते काशीराजाचे गुरु होते. आदिती पतिव्रता असुन सुर्योपासक होती. त्यांना लग्नाच्या पांच वर्षानंतर मुलगा झाला. त्याचे नांव विनायक ठेवले. विनायक रुपाने वेगळाच होता. सावळा रंग, बारीक डोळे, हत्तीसारखे कपाळ... तरीही तो आपल्या गुणांनी सर्वांचा आवडता होता.
महर्षी पराशरने विनायकाचे भाकीत सांगतांना म्हणाले, विनायक दिसायला जरी विचित्र असला तरी मनानं अतिशय सुंदर आहे. तो आर्यभूचा नायक होऊन पराक्रमी नेतृत्व करणारा बुध्दीमान होईल. सर्व देवतांमधे याला अग्रपुजेचा मान राहिल.
विनायक सहा वर्षाचा झाल्यावर त्याच्या मुंजीसाठी अनेक त्रृषी, कैलासाहुन शंकर, स्वर्गातुन इंद्र, बद्रिकाश्रमातुन व्यास आणि पाताळातुन काशीराजही आलेत. अरुंधती, रेणुका इतर अनेक देवताही आल्यात. मौजीबंधनानंंतर विनायकाने गुरुसमोर शपथ घेतली की, वेदविद्येचा अभ्यास करीन. माता-पिता आणि गुरु यांना मान देईन. देव, देश, धर्म यासाठी प्रसंगी प्राण सुध्दा अर्पण करीन. नंतर कश्यपांनी गायत्रीमंत्र, रेणुकेने परशू, शंकराने त्रिशूल व डमरु, व्यासांनी महाभारताचा पहिला पर्व, माहेश्वरीने २१ मोदक, अश्विनीकुमारांनी २१ दुर्वा आणि सर्वांनी बटुला अशिर्वाद दिला.
नंतरच्या सहा वर्षात विनायकाने चारही वेदाचा अभ्यास पुर्ण केला. आश्रमातील सर्व प्रकारची कामे मग ती कोणत्याही दर्जाची असो मनोभावे करीत असत. उरलेल्या वेळात सूत कातुन स्वतःचे वस्र विणत असे. त्याच्या मते अन्न, वस्र निवारा याबाबतीत स्वावलंबी होऊन आरोग्य, शील, बुध्दी सतेज व्हावी.
विनायकाची नम्र वागणूकीने तो सर्वांचा आवडता तर झालाच शिवाय २१०० बटु त्याला नायक मानुन त्याच्या आज्ञा पाळत. एकदा सर्व बटुंना एकत्रीत करुन २१- २१ च्या गटाने ऊभे करुन प्रत्येकाला प्रत्येकाला हुद्दाही ठरवुन दिला. एकवीस गणांचा मुख्य तो गणपती, २१ गणपतीचा मुखय तो गणेश, २१ गणनायकांचा शास्ता तो गणनाथ, २१ गणनाथांचा नियंता तो गजानन आणि २१ गजाननांचा नेता तो महागणपती. अश्या प्रकारे गटागटांनी शिस्तबध्द गण-सैन्य तयार झाले.देशात या कल्पनेचा प्रसार झाला. विनायक महागणपती बनला.
विनायकाने कल्पकतेने "ऐरावत" नावाचे नाटक लिहुन त्याचा प्रयोग सादर केला. सर्वांना खुप आवडल्यामुळे त्याची खुप प्रशंसा केली. आठवण म्हणुन महागणपतीने आपल्या ध्वजावर गजराजाचे चिन्ह ठेवलं.
बटुंचे आश्रमातील विद्याभास पुर्ण झाल्यावर ते आपापल्या गावी गेलेत, पण विनायकाच्या सुचनेनुसार त्यांनी सुर्योपासक सैन्य वाढवण्याचा उपक्रम सुरु ठेवला. काशीराजास फार मोठा आधार मिळाला. महागणपतीची किर्ती सर्वत्र पसरली. कश्यप-अदितीस धन्यता वाटली.
वेदांचं शिक्षण संपल्यावर विनायक अमरावतीजवळ अश्विनीकुमारांच्या आयुर्वेद विद्यालयात सहा वर्षे आयुर्वेदाचा अभ्यास केला. तिथल्याही विद्यार्थ्यांना सूर्योपसकाची दिक्षा दिली.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख
श्रीगणेश*
भाग २
आयुर्वेदाच्या अभ्यासाने दुर्वा, शमी, आघाडा, मंदार, तुळस, बेल इत्यादी ह्या साध्या वनस्पतीने असाध्य रोगही बरे होतात हे समजल्यामुळे याचा उपयोग जनहितासाठी करण्याचा संकल्प केला. स्वतः तो २१ दुर्वांचा रस पिऊ लागला. आयुर्वेदाचे शिक्षण संपल्यावर आर्यवर्तात उत्तर धृवापासुन विषुवृत्तापर्यत फिरुन २१ गणराज्याची स्थितीचे अवलोकन केले. प्रत्येक राज्याचा ध्वज निराळा होता... व्याघ्र, सिंह! वराह, मूषक, व षभ, गज यावरुन त्या त्या गणराज्यास गजध्वज, मूषकध्वज अशी नांवे दिल्या गेली.
आर्यावर्ताच्या बाहेर असूर व राक्षस या जाती होत्या. त्या जाती सतत भारतखंडावर हल्ले करुन खुप त्रास देत असे आणि पराभवानंतर पळून जात. असुरांच्या राज्याची श्रृंभा नांवाची राणी होती. तिचा मुलगा नरांतक हा अतिशय क्रुर व आसुरी सत्तेचा अर्क होता. श्रृंभेचे स्वप्न होते की, हिमालयाच्या पलीकडील भारतावर आक्रमण करुन संपती लुटुन तेथी २१ राज्यं जिंकुन आपले राज्य वाढवावे. अार्यांना आसुरी सत्तेपुढे नमवुन सूर्योपासक धर्माचा निःपात करावा या महत्वाकांक्षेने तीने नरांतकाला तयार केले.
आर्यांच्या गणराज्यातील फुटीरतेचा फायदा घेऊन नरांतकाने काशी राज्याचे गणराज्य सोडुन संबंध आर्यवर्त जिंकुन सिंधपुरला राजधानीची स्थापना केली. नरांतकाच्या काळ्या रंगाच्या निशानावर ३२ दातांचा दंतध्वज फडकवुन मोठ्याने गर्जना करुन म्हणायचा, "जो कोणी माझ्या विरोधात राहिल त्याला या ३२ दातांखाली चावुन खाईन."
सगळीकडे एकछत्री अंमल स्थिरावल्यावर नरांतकाने मांडलीक राजांसाठी हुकुमनामा काढला, त्यात... सूर्यमंदिरातील सूर्याच्या मुर्ती काढुन टाकणे, श्रृंभादेवीची पुजा, तरुण रुपवान कन्या असुर तरुणांना देणे, सुवर्णालंकार न घालणे, सिंधपुरच्या खजीन्यात सर्वांनी सोने जमा करणे... या कडक अंमलबजावणीमुळे आर्यवर्ताला प्रेतकळा आली होती. सुवर्णमंदिरे भ्रष्ट झालीत, रुपसुंदर तरुणींनी आत्महत्या केल्यात. राक्षसांनी नुसता धुमाकुळ घालुन दंतध्वजाचे राक्षसी सैन्य प्रजेला प्रचंड दाताखाली भरडुन काढू लागले.
नरांतकाच्या नाशासाठी नरनारायणाचा कोणी तरी अवतार घ्यावा यासाठी जनता सूर्यदेवाला आवळू लागली, मनोभावे प्रार्थना करुं लागली. ज्वलंत उपासना व आर्त प्रार्थना सूर्यमंडलास जाऊन भिडली. त्या प्रार्थनेचे फळ म्हणुन महामुनी कश्यप आणि धर्मपरायण अदितीच्या पोटी विनायकाने जन्म घेतला. त्याचा प्रभाव अठरा वर्षापर्यत आर्यांना दिसला नाही. पण... नरांतकाचे अत्याचार महागणपतीला समजल्यावर तो खूप संतापला परंतु अजुन वेळ यायची होती. एकवीस कोटी गायत्रीमंत्राचा जप करुन अस्रविद्या हस्तगत होईतर्यत नरांतकांच्पा अत्याचाराचा कळस होऊ देत, जनता भरडल्या गेल्यामुळे चीड निर्माण झाल्यावरच ते संघटीत होऊन मदत करण्याची भावना निर्माण झाल्यावरच नरांतकाचा पराभव करणे सुलभ होईल.
त्रिशुलधारी सूर्यापासक गणांच सैन्य वाढत आहे ना, याकडे महागणपतीचे पुर्ण लक्ष होते. भूतानमधल्या गौरुशंकाराच्या 'पाशुपात" नांवाच्या अस्रविद्यालयात विद्यालयात विनायकाने २१०० बटुसहित अस्रविद्या अध्ययन व यज्ञयाग शिकण्यासाठी प्रवेश घेतला. महागणपतीने हटयोग, अस्रविद्या अवगत केली. त्याची धारणाशक्ती आणि गुरुभक्ती पाहुन शंकर प्रसन्न, संतुष्ट होऊन विनायकाला आपला पुत्र मानले.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
*सृष्टीनिर्मितीसाठी ब्रम्हदेवांस श्रीगणेशाचे आशीर्वाद*
ब्रह्मदेव महान तपस्वी व्यासांना म्हणाले, “हे वत्स! मंगलमूर्ती गजाननास प्रसन्न करण्याचे अनेक मंत्र आहेत. ज्या मंत्रांमुळे सिद्धी लवकर प्राप्त होते व ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सहा सद्गुणांची प्राप्ती होते. असा मंत्र मी तुला सांगतो. गणेश मंत्रात एकूण सात कोटी महामंत्र सांगितले आहेत. त्या मंत्रांचे दिव्य रहस्य गणेश पित्यास म्हणजेच देवाधिदेव महादेवास व मला माहित आहे. महामंत्रांपैकी षडाक्षरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. अनुष्ठान करणाऱ्याचे अंतकरण प्रथम सात्विक असावयास हवे. त्याचा आहार ही सात्विक हवा. अनुष्ठान करणाऱ्या गणेश भक्ताने प्रथम अभ्यंगस्नान करून शुचिर्भूत व्हावे, नंतर सोवळे नेसून दर्भासन किंवा त्यासारख्या शुद्ध आसनावर मनात कोणताही विकल्प न आणता बसावे. नंतर ॐ केशवाय नमः | ॐ नारायणाय नमः | ॐ माधवाय नमः | असा नामोच्चार करत आचमन करावे. त्यानंतर प्राणायाम करावा. श्रीगजाननाच्या पवित्र चरणकमलांपासून मस्तकापर्यंतच्या दिव्य स्वरूपाचे हृदयात ध्यान करून मानसपूजा करावी.” अशा प्रकारे ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. महर्षी व्यासांना समाधान झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचे आभार मानले.
*एकाक्षरी मंत्र* : ॐ गं ॐ
*षडाक्षरी मंत्र* : ॐ वक्रतुण्डाय हुं ॐ
देवाधिदेव ब्रह्मदेवाकडून ही फलश्रुती ऐकून व्यासांना परमानंद झाला. ते ब्रह्मदेवास म्हणाले, “हे वात्सल्यमूर्ती ब्रह्माजी, आपण जे काही आत्ता सांगितले ते ऐकून माझे कान तृप्त झाले. या मंत्राचा महिमा विलक्षण आहे. किती ऐकले तरी मला समाधान होत नाही. त्यामुळे या दिव्य मंत्राच्या सहाय्याने कोणती सिद्धी प्राप्त झाली हे मला सांगा”, त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी व्यासांना खालील माहिती दिली.
सृष्टी निर्मितीची जबाबदारी ब्रह्मदेवावर पडल्यावर त्यांना ही सृष्टी कशी निर्माण करावी याबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यावेळी त्यांनी गणेशाची प्रार्थना केली की, “हे विघ्ननाशका, सृष्टी निर्मितीबाबत मी अज्ञानी आहे. मला याबाबतीत मार्गदर्शन करावे.” तेव्हा विनायक म्हणाले, “हे काम वाटते तेवढे अवघड नाही. माझ्या देहात सर्व ब्रह्मांड आहे, ते ब्रह्मांड एकदा तुम्ही पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व कल्पना येईल.” त्यानंतर श्रीगणेशाने ब्रह्मदेवास आपल्या श्वसन मार्गाने उदरात नेले. ब्रह्मदेवांना गणेशाच्या देहात अनेक ब्रम्हांडे दिसली. त्यामुळे ब्रह्मदेव भांबावून गेले. गजाननाने स्वतःच्या अफाट शक्तीने एक ब्रम्हांड फोडून दाखवले. या ब्रम्हांडात ब्रह्मदेवास सर्व सृष्टीचे दर्शन झाले. त्या उदरातील ब्रम्हांडात पृथ्वी, मनुष्य, ऋषी, राक्षस, देव, स्वर्ग इत्यादि सर्वांचे दर्शन. झाले अशा प्रकारच्या अनेक सृष्ट्या विनायकाच्या उदरामध्ये ब्रह्मदेवांना बघावयास मिळाल्या. ब्रम्हांडाची रचना पाहून ब्रह्मदेव गोंधळून गेले. त्यांनी गणेशाला उदरातून बाहेर काढण्याची विनंती केली. ते म्हणाले, “ब्रह्मांडाचा अंत पाहणे माझ्या हातून शक्य नाही. माझे आठ डोळे सुद्धा ब्रह्मांड पाहण्यास अपुरे आहेत. खरोखर तू अनादि अनंत आहेस.” ब्रह्मदेवाची हि द्विधा स्थिती पाहून श्री गणपतीने त्यास आपल्या उदरातून बाहेर काढले.
आपल्याला साक्षात लंबोदर श्रीगणेशाचे दर्शन झाले व स्वतः गणेशाने आपणास वेद, शास्त्रे, पुराणे यांचे गुढ ज्ञान दिले, अशामुळे ब्रह्मदेवास गर्व झाला. त्यांना वाटले की माझ्यासारखा भाग्यवंत त्रैलोक्यात कोणीही नाही. आता आपण कोणालाही वाटेल तो वर किंवा शाप देऊ शकतो. सृष्टीची निर्मिती करणे सुद्धा अत्यंत सोपे आहे. असे समजून त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीस सुरुवात केली. पण दुर्दैवाने अनेक विघ्ने समोर येऊन उभी राहिली. हजारो विघ्ने ब्रह्मदेवाभोवती गोल गोल फिरू लागली. ब्रह्मदेवासमोर सर्व विघ्ने विचित्र हातवारे करत नाचू लागली. त्या सर्वांनी ब्रह्मदेवास उचलले व वर फेकले. खाली पडल्यानंतर एकाने ब्रह्मदेवाच्या चारही शेंड्या धरल्या व ओढायला सुरुवात केली. दुसऱ्या विघ्नाने ब्रह्मदेवाची दाढी उपटण्यास सुरुवात केली. पाच सहा विघ्नांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवास टपला मारण्यास सुरुवात केली. अशा रीतीने ब्रह्मदेवास त्या विघ्नांनी छळून काढले. काही वेळानंतर ब्रह्मदेवास श्री गणेशाचे स्मरण झाले.
आता श्री गणेश आपणास सोडवेल असे त्यांना वाटले. ब्रह्मदेव म्हणाले, “हे गजानना, तू विघ्नहर्ता आहेस. असे असताना सुद्धा मी सृष्टी निर्मिती करत असताना विघ्ने कशी काय उत्पन्न झाली ? हे विघ्ने मला छळून काढत आहेत. तू यांचा बंदोबस्त कर.” अशा पद्धतीने ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे प्रार्थना केली. त्यानंतर ब्रह्मदेव शांतपणे बसले होते. तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक स्वप्न पडले. स्वप्नात ब्रह्मदेवास एक मोठा वटवृक्ष दिसला. त्यांना वटवृक्षाच्या एका पानावर एक गोंडस निरागस बालक दिसले. त्या बालकाला चार करकमल होते, सर्वांगाला रक्तचंदनाची उटी होती. त्या बालकाच्या मस्तकावर रत्नांनी जडलेला मुकुट होता. गळ्यात सुवर्णमाला होत्या. कानात सुवर्ण कुंडले होती, त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते पण डोके मात्र हत्तीचे होते. त्याचा एक दात तुटलेला होता. त्या बालकाचे रूप मनोहर होते. बालकरुपी गजाननाने खाली उडी मारली व ब्रह्मदेवांकडे आले व त्यांना म्हणाले, “हे विधाता, सृष्टी निर्मिती करताना मी श्रेष्ठतम आहे असा तुला गर्व झाला. कोणतीही गोष्ट गर्वाने करू नये. तुझे गर्वहरण करण्यासाठी नानाविध विघ्नांनी तुला छळून काढले. आता मी तुझ्या मनातले ओळखले आहे. मी तुला सर्वात दिव्य असा एक अक्षरी मंत्र सांगतो. तू या मंत्राचा दहा लक्ष जप कर. त्यानंतर मी तुला सामर्थ्यवान बनवेन.”
ब्रह्मदेवांना जाग आली. तेव्हा ताबडतोब त्यांनी एकअक्षरी मंत्रउच्चारण द्वारा तपश्चर्येला प्रारंभ केला. ब्रह्मदेवाची ही घोर तपश्चर्या पाहून लंबोदर श्रीगणेशास आनंद झाला. गणेश ब्रह्मदेवास प्रसन्न झाला. गणेशाने ब्रह्मदेवास दिव्य दर्शन दिले. ब्रह्मदेवाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी गणेशास साष्टांग नमन केले व म्हणाले, “हे ओंकारस्वरूपा! तू अनाथांचा नाथ आहेस. तुझे हे दिव्य दर्शन भाग्यवंतांनाच लाभते. आज सोनियाचा दिवस आहे. तू माझ्यावर प्रसन्न झालास, त्यामुळे मी तुझ्याकडे वर मागतो. माझ्या हृदयकमलात तुझे सदैव स्मरण राहू दे. तुमच्या कृपेने मला सर्व सृष्टीची निर्मिती करता यावी. मी ज्या वेळी आपणास मार्गदर्शनासाठी बोलवेन तेव्हा आपण जरूर यावे.” श्री गणेश म्हणाला, “माझा मधुर प्रसाद सेवन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तसेच माझ्या स्मरणाने तूमची सर्व विघ्ने नाहीशी होतील. मी सदैव तुमच्या वर कृपा वर्षाव करेन. आता तुम्ही वेळ न घालवता विश्वनिर्मितीच्या कामाला लागा.”
श्री गजाननाने ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे त्याला सृष्टी रचना करण्याचे दिव्य सामर्थ्य दिले. पूजा झाल्यानंतर तेथे दोन लावण्यवती कन्या निर्माण झाल्या. या दोन देवि लावण्यवती कन्या म्हणजेच सिद्धी व बुद्धी होय. ब्रह्मदेवाने या विश्वातील प्रत्येकाचे कल्याण होवो असा वर मागितला. सिद्धी व बुद्धीस श्री गणेशाकडे सुपूर्त केले. श्री गणेशाने त्या दोन कन्यांचा स्वीकार केला.
ब्रह्मदेवाने सर्वप्रथम गजाननाचे पुन्हा एकदा स्मरण केले. आपले बाहू, मांड्या व चरणकमल यांपासून क्षत्रिय वगैरे तीन वर्णांची उत्पत्ती केली. नाभिककमला पासून आकाश, मस्तकापासून स्वर्ग, चरणकमला पासून पृथ्वी अशा पद्धतीने चातुर्य पूर्वक ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती केली. त्यानंतर ब्रह्मदेवाने अनेक वस्तू निर्माण केल्या. या वस्तूंची निर्मिती केल्यामुळे मनुष्याला फायदाच झाला. यामध्ये ब्रह्मदेवाने सागर, पर्वत, सरिता, वृक्ष, वेली, गवत इत्यादी अनेक वस्तू निर्माण केल्या.
[30/08, 12:20 am] +91 83290 19361: *श्री गणेश पुराण कथा (ब)*
*सिद्धीविनायकाची महिमा, मधु व कैटभ दैत्यांचा वध*
काही काळानंतर एक आश्चर्य घडले. सृष्टी निर्मिती करते वेळी लक्ष्मीपती श्रीविष्णू निद्रावस्थेत होते. त्यांच्या कर्णातून दोन अक्राळविक्राळ राक्षस आले. हे दोन राक्षस म्हणजे मधु व कैटभ होय. त्या राक्षसांनी सृष्टीचा निर्माण कर्ता ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक ऋषी मुनींच्या आश्रमांवर हल्ले केले. आश्रमांची नासधूस केली. त्या दोघांनी त्रैलोक्यात सर्वत्र हाहाकार माजवला. त्या दोघांनी नंतर स्वर्गावर आक्रमण केले. ते दोघेही महापापी होते. त्यामुळे ते वेद,शास्त्र, पुराने यांची निंदा करताना घाबरत नसत. त्या दोघांनी ब्रह्मदेवावर हल्ला केला. त्यांना गिळून टाकण्यासाठी कैटभाने आपले विशाल तोंड उघडले. ब्रह्माने प्रसंगावधान राखून निद्रादेवीची स्तुती केली.
या निद्रादेवीने विश्वाचा पालनकर्ता विष्णूस मोहित केले होते. त्यामुळे विष्णू निद्रावस्थेत गेले होते. ब्रह्मदेव म्हणाले, “हे देवी, तुझी लीला अगाध आहे. तू साक्षात विष्णूस मोहित केलेस. आता विष्णु जागे करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यांना तू जागे केले नाहीस तर सर्व अनर्थ होईल. त्यामुळे तू लवकरात लवकर विष्णूलोकी जा व केशवास जागे कर.” देवाधिदेव विष्णू जागे होईपर्यंत या राक्षसांनी अत्यंत गोंधळ केला होता.
त्यानंतर केशवाला जाग आली. त्या दोघांनी विष्णूस युद्धासाठी आव्हान दिले. विष्णूने ते आव्हान स्वीकारून घनघोर युद्ध केले. दोघांबरोबर विष्णूने मल्लयुद्ध सुरू केले. हे मल्लयुद्ध पाहण्यासाठी आकाशात देव-देवतांची गर्दी झाली. दोघे दैत्य व विष्णू आपली पूर्ण शक्ती पणास लावत होते. काही वेळा त्यांनी विष्णूंना खाली पाडले तर काही वेळा विष्णूने त्यांना गरगर फिरवून जमिनीवर आपटले. पण विष्णू राक्षसांचा पराभव करु शकले नाही. त्यामुळे विष्णु उदास झाले. त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी गायनामध्ये निपुण असलेल्या गंधर्वाचे रूप घेतले व हाती वीणा घेऊन दरबारी, कानडा, मालकंस, यमन, कल्याण इत्यादीसारख्या अनेक रागांचे गायन केले.
अशा प्रकारे त्यांचे स्वर्गीय आनंद देणारे गाणे ऐकून देव ,गंधर्व आनंदित झाले. शंभू महादेवांना सुद्धा हे दिव्य गायन ऐकून आनंद झाला. नारायणाने कैलासावर शंकराचे दिव्य दर्शन घेतले. भोलेनाथ व्याघ्र चर्मावर बसले होते. शेजारी त्रिशुल होते, तेथेच डमरू सुद्धा होता. गळ्यात साप होता. सर्वांगाला भस्म फासले होते. विष्णूने महादेवास नमन केले. विष्णू म्हणाले, “हे शिवशंभो, आज तुमचे दिव्य दर्शन झाल्यामुळे परमानंद झाला. सतत ॐ नमः शिवाय चा जप करणारे शिवभक्त तुमच्या चरणी लीन होतात. तुम्हाला कोटीकोटी प्रणाम.” विष्णूंचे गाणे ऐकून त्यांचे सुपुत्र श्रीगणेश, प्रियतमा पार्वती, नंदीला वगैरे आनंद झाला. विष्णू म्हणाले, “हे त्रिनेत्रधारी शिवशंभो, सर्व त्रैलोक्यात मधु व कैटभ यांनी गोंधळ माजवला आहे. या दुष्टांचा बंदोबस्त कसा करावा हा यक्षप्रश्न माझ्यासमोर उभा आहे.” भोलेनाथ म्हणाले, “हे विष्णु, तुम्ही युद्ध करण्यापूर्वी माझ्या सुपुत्राचे म्हणजेच गणेशाचे स्मरण केले नाही. त्यामुळे तुम्हाला अपयश आले. आता दुसरे युद्ध करण्यापूर्वी गणेशाचे पूजन करूनच युद्धास सुरुवात करा.गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करा.”
भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे श्रीविष्णू तपश्चर्येसाठी गेले. श्रीविष्णूंनी सिद्धिक्षेत्र तपश्चर्येसाठी निवडले. त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्या पावन क्षेत्रात नारायणाने षडाक्षरी मंत्राचा शास्त्रशुद्ध जप केला. त्यानंतर लंबोदर श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले व म्हणाले, “हे लक्ष्मीपती, तुमच्या तपश्चर्येमुळे मी संतुष्ट झालो आहे. तुम्ही शंभर वर्ष तप केले, त्यामुळे तुम्ही धन्य आहात. तुम्हाला हवा तो वर मागून घ्या.” त्यावर विष्णू म्हणाले, “आपण शिवपार्वतीचे सुपुत्र आहात. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे. मला मधु व कैटभ या दोन दैत्यांना ठार मारायचे आहे. त्यासाठी मला शक्ती व युक्ती द्या. तसेच आणखी कोणी राक्षस उत्पन्न झाल्यास त्यांना ठार मारताय यावे म्हणून दिव्यास्त्र प्रदान करा.”
गणेशांनी त्यांची मनोकामना पूर्ण केली. जिथे विष्णूंना वर मिळाला त्याच ठिकाणी विष्णूंनी एक मोठे मंदिर बांधले. त्या मंदिरातल्या भिंतींवर श्रीगणपती अथर्वशीर्ष, गणपतीस्तोत्र कोरून घेतले. त्या ठिकाणी गंडकी शिळेची सुंदर मूर्तीची स्थापना केली. त्या ठिकाणी नारायणास सिद्धी प्राप्त झाली, म्हणून त्या मूर्तीस सिद्धिविनायक असे नाव दिले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन विष्णू मधु व कैटभ या दोन दैत्यांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाले. त्या तिघांमध्ये घनघोर युद्ध झाले.
बराच काळ युद्ध सुरू होते. श्री विष्णू दैत्यांना म्हणाले, “तुम्ही दोघेही शूरवीर आहात. आज पर्यंत मी तुमच्यासारखे योध्ये पाहिले नाहीत. मी तुमच्यावर प्रसन्न आहे, त्यामुळे तुम्ही मागाल तो वर देण्यास मी तयार आहे. ही सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही.” जगदीश्वराच्या या बोलण्यावर ते दैत्य मोठ्याने हसू लागले. ते विष्णूस म्हणाले, “अरे तुझ्या पेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. तुलाच एखादा वर हवा असेल तर मागुन घे. आम्ही वर देण्यास तयार आहोत.” विष्णूंनी क्षणभर विचार केला व म्हणाले, “आपला मान राखण्यासाठी मी एक वर मागतो तो मला आपण द्यावा. तुम्ही दोघांनी माझ्या हस्ते यमलोकी जावे, असा मला वर हवा आहे.” विष्णूंच्या चातुर्यपूर्वक उत्तरामुळे मधु व कैटभ दैत्य विष्णूला शरण गेले व म्हणाले, “आपली योग्यता श्रेष्ठतम आहे. त्यामुळे हे देवाधिदेव नारायणा, तूच आमचा वध कर. त्यामुळे आम्हाला मोक्ष मिळेल.” त्या नंतर त्या दोघांनी नारायणाला साष्टांग नमस्कार केला. त्या दोन्ही दैत्यांच्या इच्छेनुसार आपल्याजवळील सुदर्शनचक्राने विष्णूनी दोघांचा वध केला. मधु व कैटभ दैत्यांचा नाश केल्याने विष्णू मधुसूदन या नूतन नावाने ओळखले जाऊ लागले. विष्णुसहस्त्रनामावली मध्ये मधुसूदन या नावाचा उल्लेख आढळतो.
रीगणेश*
भाग - ३.
धनुर्विद्या आणि एकवीस कोटी गायत्रीमंत्राचा जप विनायकाने पुर्ण केला. शिक्षण आणि तपश्चर्या पुर्ण झाल्यावर आपल्या सहकार्यांसह शंकराचा निरोप घेऊ लागला तेव्हा शंकर-पार्वतीला गहिवरुन आले. वियोग सहन होत नव्हता, पण प्रजाहितासाठी नरांतकाचा नाश करणे अनिवार्य होते. भूतान राज्यातील लोक गणपतीला पार्वती-शंकराचा मुलगाच मानत. तीच प्रथा आर्यवर्तात रुजु झाली.... दंतकथा अशीही आहे की, एकदा पार्वती स्नानाकरितां गेली असतांना गणपतीला दारावर पहार्यासाठी उभे राहायला सांगुन कुणालाही आंत येण्यास मज्जाव करावा अशी आज्ञा दिली.
पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे विनायक दारावर पहार्याकरिता ऊभा असतांना शंकर तिथे येऊन आंत जाऊ लागले म्हणून गणपतीने त्यांना विरोध केला असतां संतापाच्या भरात शंकराने त्याचे शीर धडावेगळे केले. पार्वतीला कळल्यावर तिला शोक अनावर झाला. गणपतीला जिवंत करण्यासाठी ती शंकराला विणवू लागली. तेव्हा शंकराने हत्तीचे मस्तक आणुन त्याच्या धडावर ठेवल्याबरोबर तो जिवंत झाला.
चोवीस वर्षाचा तरुण विनायक श्रीशंकराचा आशिर्वाद घेऊन प्रत्येक राज्यातील गुरुकुलात जाऊन तिथल्या विद्वान पंडीतांशी वादविवाद करुन विजयपत्र घेऊ लागला. त्याच्या २१०० मित्रांनी राज्यातील गावोगावी जाऊन सुर्योपासनेचा प्रचार करुन शिस्तबध्द गणसैन्य तयार होऊ लागले.
नरांतकाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या अनाथांच्या आर्त किंकाळ्या ऐकुन त्यांना धीर देत अश्रू पुसू लागला. गणसैन्याचं संचालन सुरु होऊन असुरी सैन्यांना प्रतिकार होऊ लागला. नरांतकाच्या हेरांचा प्रमुख धुम्राक्षाने बातमी दिली की, "कश्यपपुत्र विनायकाने २१ - २१ च्या गटाने त्रिशूल घेऊन गजध्वजाखाली जमतात. सुर्योपासना व गायत्रीमंत्र हा त्यांचा धर्म असुन देव, देश आणि धर्म यांच्या संरक्षणासाठी हे लोक आपल्या हुकुमाचा व सैन्याचा प्रतिकार करीत आहेत, शिवाय आर्य स्रीयांही या चळवळीत भाग घेत आहेत. आपण ज्या २१ हजार तरुणींना सिंधुपुरातील कारागृहात बंदिस्त केल्यात, त्यांच्या सुटकेसाठी रिध्दी-सिध्दी प्रयतनशील आहेत. महागणपतीच्या नेतृत्वाखाली मोठे स्रीसैन्य तयार होत आहे.
धुम्राक्षाने दिलेली माहिती ऐकुन क्रुर नरांतकाचा संताप अनावर होऊन त्याने जनतेवर, स्रीयांवर अत्याचाराचा कळस गाठला. एकदा कांबोज नगरीतील कांबोजिया नदीत रिध्दी सिध्दी गायत्रीमंत्रांचा जप करीत असतां विनायक त्यांना भेटला. सिंधपुरातील बंदिवासात असलेल्या एकविस हजार तरुणींंना सोडवण्यासाठी मार्गदर्शन मागीतले असतां, महागणपतीने २१-२१ च्या गटाने स्रीसैन्याची आखणी करुन आठ विभाग करायला सांगीतले. शक्ती, भक्ती आणि तेजाचे हे कार्य केल्यास भारतखंडाच्या ऊत्कर्षास साह्य होईल, कामाची वाटणी कशी करायची हे मार्गदर्शन करुन तो घरी आला असतां, व्यासांनी त्याला बद्रीकाश्रमी बोलावल्याचा निरोप मिळाला, त्याचवेळी रत्नापुरच्या काशीराजांकडून त्यांच्या मुलाच्या राजपुत्राच्या लग्नाचे पौरुहित्य करण्यासाठी निमंत्रण आले.
विनायकाची द्विधा मनःस्थिती झाली, प्रथम व्यासभेट घेण्यासाठी बद्रीकाश्रमाकडे निघाला. महागणपती ज्या रस्त्याने जाणार त्या जंगलांत नरांतकाचे सैन्य विनायकाला ठार करण्यासाठी दडुन, लपुन बसले. विनायक त्यांच्या कक्षेत आल्याबरोबर एक पिसाळलेला हत्ती त्याच्यावर सोडला. सावध विनायकानं हत्तीवर पाश फेकुन त्याची सोंड व पुढील पाय आवळुन त्याच्या गंडस्थळावर त्रिशुल खुपसुन ठार केले. एवढा मदोन्मत हत्ती कोसळलेला पाहुन राक्षससैन्य पळुन गेले.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
श्रीगणेश*
भाग- ४.
विनायक बद्रिकाश्रमात पोहोचल्यावर व्यासांना वंदन करुन बोलावल्याचे कारण विचारले असता ते सद्गतीत कंठाने म्हणाले, "विनायका, तू कवींचा कवी, बुध्दिवंताचा बुध्दिदाता आहेस. तुला मौजीबंधनाच्यावेळी पहिलं पर्व अर्पण केले होते. नंतर अठरा पर्वाचा अाराखडा पुर्ण केला, तरी तू महाभारत लिहावेस." त्याची आज्ञा शिरसावंद्य मानुन गणेशाने, सरस्वती तर त्याच्यावर लुब्ध होतीच, तीच्या प्रेरणेने महाभारत लिहिण्याचे कार्य व्यास कुटीत बसुन पुर्ण केले. व्यासांचा निरोप घेतांना व्यास आशिर्वाद देतांना त्याला म्हणाले, "हे सूर्योपसका! या थोर भारतात तुझ्या आज्ञा वेदाप्रमाणे मानल्या जाऊन सर्वत्र विजयी होशील."
बद्रीकाश्रमातुन निघतांना महागणपतीने २१०० महाभारताच्या प्रती संबंध आर्यवर्तात पाठविल्यात. घरोघरी महाभारताचं वाचन, पठन, मनन सुरु झालं. त्याचं नांव अबालवृध्दांच्या जीभेवर खेळु लागलं." श्री गणेशाय नमः।" असा मंत्र आबालवृधांच्या जीभेवर खेळु लागलं. प्रत्येक ठिकाणी गणेशाचं पुजन सुरु झालं. महागणपती आपल्या २१०० गणांसह सिंधूपुरास वळसा घालुन महापर्वत ज्वालामुखी ओलांडुन पाताळात रत्नापुरच्या काशीराजांच्या मुलाच्या लग्नास निघाला असतां वाटेत पुनः एक विघ्न आले.
वाटेतल्या भयंकर अरण्यात नरांतकाच्या सैन्याने गणपती व त्याच्या गणांवर जोरदार हल्ला चढविला. दोन्हीकडच्या सैन्यामधे भयंकर युध्द सुरु झाले. शेवटी दुर्वासांनी दिलेल्या शक्तीचा उपयोग करुन एक तेजस्वी बाण जो शंकरांनी दिला होता, सुवर्णभूषित, धुम्रयुक्त आणि भूजंगाप्रमाणे तिक्ष्ण बाण सूर्याला वंदन करुन पाशुपत धनुष्यास जोडुन नरांतकाच्या वक्षस्थळावर सोडल्याबरोबर नरांतक भूमीवर कोसळला. गणेशाने सिंधूपुरांत बंदिस्त असलेल्या एकवीस हजार कुमारिका बंधनमूक्त केल्यात. त्याच्या सन्मानार्थ अनेक वैभवसंपन्न राजांकडुन भोजनाचे निमंत्रणे आलीत, एका गरीब त्रृषीने तर गुळखोबर्याचे एकवीस मोदक करुन खाऊ घातले. विनायकाला खुप आवडले. तेव्हापासुन गणपतीला एकवीस मोदकांचा नैवद्य दाखवणे सुरु झाले.
भाद्रपद शुध्द चतुर्दशीला श्रीमहागणपती आपल्या अनुयायानासह रत्नपुरीहून उत्तरेस निघाला. जनतेने गणेशाच स्मारक म्हणुन हत्तीचा मुखवटा घातलेली भव्य मूर्ती तयार करुन भक्तीभावाने मंदिरात स्थापना केली. दहा दिवस उत्सव केला. नंतर विनायक हिमालयाकडे निघालाक प्रत्येक ठिकाणी जनतेने भव्य स्वागत सत्कार करुन उत्सव केलेत. गणेश पित्याच्या.. कश्यपांच्या आश्रमात येऊन माता पित्यांस वंदन केले.
विश्ववंद्य झालेल्या आपल्या पुत्राने तिन्ही लोकांत किर्तीचा झेंडा रोवलेला पाहुन माता अदितीस खुप धन्यता वाटली. अदिती विनायकास म्हणाली, तुझे ब्रम्हाश्चर्यव्रत संपला. ब्रम्हदेवाची मुलगी कुमारी सरस्वती-शारबा तुझ्यासाठी निवडली. तू महाभारताची रचना केलेली पाहुन ती तुझ्यावर अनुरक्त, लुब्ध झाली. तिच्याशी तू लग्न करावेस. नम्रतेने गणेश आईला म्हणाला, माते! क्षमा कर. मला संसारात पडायची इच्छा नाही. भारताची सेवा करण्यातच मला आयुष्य घालवायचे आहे.
अधर्मिय दुष्टांकडुन अत्याचार होतील त्यावेळी देव, देश, धर्म आणि आर्यस्रीधनाचं रक्षण व्हावं ह्या कार्याचे जनतेस स्मरण व्हावं, म्हणुन दरवर्षी दहा दिवस साजरे व्हावेत, या कार्याचा संपुर्ण विश्वात प्रसार करण्याचे ठरविले. आताही गणेश चतुर्थीपासुन अनंतचतुर्दशीपर्यत गणेशोत्सव आपण दरवर्षी
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
*श्री गणेश पुराण कथा (क)*
*भीमराजाची कथा*
महान तपस्वी व्यासांना ब्रह्मदेवांनी गणेश महात्म्य संबंधी आणखी एक रसाळ कथा सांगण्यास प्रारंभ केला.
भीम राजा विदर्भ देशातील कौण्डिन्य नगरात राहात होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती, सत्ता,ऐश्वर्य होते. भीम राजा मोठा पराक्रमी व दानशूर होता. प्रजादक्ष होता. अशा भीम राजास एक सात्विक, पतिव्रता प्रियतमा होती. तिचे नाव होते चारुहासिनी. तिला कशाचीही कमतरता नव्हती. पण मूलबाळ नसल्याने ती दुःखी असे. आपल्या अर्धांगिनीला झालेले दुःख राजास सहन होत नसे. एके दिवशी राजा आणि राणी एकांतात बसले होते. भीम राजा म्हणाला, “हे प्रिये, आपल्या विवाहास खूप वर्ष झाली. पण अजून सुद्धा पुत्रसंतती झाली नाही. त्यामुळे आपण राज्यत्याग करून, देवाची तपश्चर्या करण्यासाठी घनदाट अरण्यात जाऊ. त्यातच आपले हित आहे.”
त्यानंतर भीम राजांनी दोन विश्वासू प्रधानांना बोलवले. त्या दोन प्रधानांची नावे मनोरंजन व सुमंत अशी होती. त्यांना भीम राजा म्हणाला, “आम्ही दुःखी होऊन ह्या राज्याचा त्याग करुन वनात तपश्चर्या करण्यासाठी जात आहोत. तेथून आमचे पुन्हा येथे आगमन झाले नाही तर दोघांमध्ये अर्धे अर्धे राज्य वाटून घ्या व सुव्यवस्थित राज्यकारभार चालवा. प्रजेची काळजी घ्या.” नंतर भीम राजाने सपत्नीक अरण्याकडे प्रस्थान केले. ते दोघेही घनदाट अरण्यात आले. त्यांना तेथे एक निसर्गरम्य आश्रम दिसला. तो आश्रम महान तपस्वी विश्वामित्र ऋषींचा होता. तेथे विश्वमित्र दर्भासनावर शांतपणे बसले होते. ते दोघेही त्या आश्रमात गेले. आश्रमात आल्यानंतर भीम राजा व राणीने त्यांना वंदन केले. आपल्या दिव्य ज्ञानाने राजाचे आगमन येथे कशासाठी झाले आहे हे त्यांनी ओळखले.
विश्वमित्र ऋषी म्हणाले, “तुला सर्व सुखांची प्राप्त होईल, तुझ्या पोटी सद्गुणी, सात्विक, कीर्तीमान पुत्र जन्म घेईल. तू शिवपार्वती सुताचे म्हणजेच श्री गणेशाचे पूजन करण्यास सुरुवात कर. त्या गणेशास सर्व गोष्टीचे ज्ञान आहे. तुझे कुलदैवत मंगलमूर्ती श्री गणेश असताना सुद्धा संपत्तीच्या अहंकारामुळे तू त्याचे पूजन केले नाहीस. तेहतीसकोटी देवदेवतांमध्ये गणेशास अग्रपूजेचा मान मिळाला आहे. त्याचे स्मरण न केल्यामुळे सर्व देवदेवता तुझ्यावर असंतुष्ट आहेत. त्यामुळे तू निपुत्रिक आहेस. गजाननाच्या कृपेमुळे तुला नक्कीच संतान प्राप्ती होईल. तो आपल्या भक्तांची कामना पूर्ण करतो. आता तुला तुझ्या पूर्वजांचे चरित्र सांगतो, ते नीट ऐक.”
तुझ्या सातव्या पूर्वजांचे नाव होते भीम. तो सुद्धा पराक्रमी राजा होता. त्याच्या अर्धांगिनीचे नाव होते कमला. या दांपत्यास अनेक वर्षानंतर संतानप्राप्ती झाली. तो मुलगा जन्मताच मुका व बहिरा होता. त्याच्या पाठीला कुबड होते. सर्वांगाला क्षते पडली होती. सर्वांगाला दुर्गंधी येत होती. यामुळे महाराणीस रडू कोसळले. आता आपणच मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे राजास वाटले. राजाने काही विद्वान ज्योतिषांना या राजपुत्राचे नाव काय ठेवू असा प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले, “राजन राजपुत्रास जन्मताच व्यंग आहे. त्याची जन्मभर दक्षता घ्यावी लागेल. त्यामुळे तू त्यांचे नाव दक्ष असे ठेव.” नामकरण समारंभानंतर आपल्या पुत्रासाठी राजाने अनेक मंत्र, तंत्र, देशी-विदेशी औषधे उपाय करून पाहिला. पण सर्व परिश्रम वाया गेले. त्यामुळे राजाने एक तप तपश्चर्या केली. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.
राजाच्या मनावरचा संयम गेला. तो चिडक्या स्वभावाचा झाला. एक दिवस रागाच्या भरात आपल्या प्रियतमेस म्हणाला, “तू व तुझा मुलगा येथून ताबडतोब जा. मला तुम्हा माय लेकाचे तोंड देखील पाहण्याची इच्छा नाही.” असे बोलून राजाने त्या दोघांना घरातून हाकलून दिले. आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन कमला राणी गावोगावी फिरून भिक्षा मागून पोट भरत असे. ती भिक्षा मागण्यासाठी जाताना मुलाला मंदिरातच ठेवत असे. एकदा अशीच ती भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेली असता, तेथे एक महान भगवद् भक्त आला. तो ब्राह्मण होता. त्याच्या नजरेस ते मूल दिसले. त्याची दया येऊन ब्राह्मणाने ते उचलेले. ब्राह्मणाच्या शरीरावरून आलेल्या वाऱ्याच्या स्पर्शाने त्या व्यंग मुलाचे सर्वांग व्यवस्थित झाले. तो सामान्य मुला सारखा दिसू लागला. कुरूप मुलाचे गोंडस, मनमोहक मुलामध्ये रूपांतर झाले. त्याच्या अंगावरील सर्व क्षते नाहीशी झाली.
कमला राणी भिक्षा मागून परत आल्यानंतर तिला फार आनंद झाला. हे आपले मुल सुंदर कसे काय झाले ते तिला कळेना. तिने देवाचे आभार मानले. त्यानंतर काही वर्षानंतर देवास आपण प्रसन्न करून घ्यावे असे राजपुत्रास वाटले. दक्ष मनात म्हणाला, ‘तेहतीस कोटी देव देवता असून सुद्धा, श्री गणेशास अग्रपूजेचा मान आहे. तेव्हा मंगलमूर्तीलाच आपण प्रसन्न करून घेऊ या. तोच आपली मनोकामना पूर्ण करेल.’ दक्षाने श्रीगणेश उपासनेस प्रारंभ केला. प्रथम ॐ गं गणपतये नमः असा अष्टाक्षरी मंत्र जपण्यास सुरुवात केली. श्री गणेश त्याला प्रसन्न झाले. तेव्हा दक्षास गणपतीचे मनोहर रूप दिसले. एका क्षणातच गणपतीने ब्राह्मणाचे रूप घेतले व म्हणाले, “मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझी या लहान वयात बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे.”
यावर राजपुत्र दक्ष म्हणाला, “हे शिवपार्वती सुता, गजानना, आता साक्षात तुझे दर्शन झाल्यामुळे मी आनंदी आहे. मी आता तुमच्याकडे वर मागतो.” त्यामुळे गजाननाने आपले पूर्वरूप धारण केले व म्हणाले, “बाळा, मी तुला वर देत नाही. कारण तो अधिकार माझा लाडका भक्त मुद्गल याचा आहे. त्याच्याच दिव्यस्पर्शामुळे तुझे शरीर सर्वांगसुंदर झाले. तू त्याच्या आश्रमात जाऊन भेट घे. तो नक्कीच तुला वर देईल.” असे सांगितल्यावर गणपती अंतर्धान पावले. हे पाहून दक्षाला रडू कोसळले. गजानन अंतर्धान पावल्यानंतर सर्वकाही त्याग करून दक्ष श्रीगणेशाच्या शोधासाठी बाहेर पडला. त्याच्याबरोबर त्याची माता पण होती. अशाप्रकारे भटकंती करत सुदैवाने राजकुमार दक्ष मुद्गल ऋषीच्या आश्रमात गेला.
भक्तिमय वातावरण पाहून दक्षास परमानंद झाला. आश्रमात व्याघ्र आसनावर मुद्गल ऋषी बसले होते. त्यांच्या समोर श्रीगणेशाची एक मनमोहक मूर्ती होती. ते भक्तीयुक्त अंतःकरणाने श्रीगणेशाची पूजा करत होते. दक्षाने त्यांना नमन केले. दक्ष म्हणाला, “मुनीवर, आपले उपकार मी कधीही विसरणार नाही. तुमच्या मुळेच माझे कुरूप शरीर सुंदर झाले. श्री गजाननाने मला दोन रूपाचे दर्शन घडविले. त्यांनी मला सांगितले की आपण मला वरदान द्याल , म्हणून मी येथे आलो आहे.” राजपुत्राचे हे बोलणे ऐकल्यानंतर मुद्गल ऋषी म्हणाले, “दक्ष, तु खरोखर भाग्यवान आहेस. साक्षात श्री गजाननाने तुला द्वी रूप दाखवले. म्हणजे भक्तीत तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मी गेल्या हजार वर्षापासून गणपतीच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत आहे, तरीसुद्धा तो माझ्यावर असंतुष्ट आहे.” असे बोलून मुद्गल ऋषिंनी दक्षास मिठी मारली.
त्यांनी राजपुत्रास एका दिव्य मंत्राचा उपदेश केला. तो दिव्य मंत्र म्हणजे एकाक्षर मंत्र होय. ऋषी म्हणाले, “तू नित्यनेमाने, भक्तिमय अंतकरणाने या एकाक्षर मंत्राचा निष्ठापूर्वक जप करत जा. यामुळे श्री विनायक तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.”
*श्रीगणेश*
भाग -५.
सर्व शास्रांमधे श्रीगणेशाला सर्व देवांपेक्षा महत्वाचं स्थान आहे. श्रीगजाननाची अाराधना म्हणजेच सर्व देवांची आराधना केल्याचं फळ मिळते, कारण ब्रम्हा, विष्णु, महेश तीन मुख्य देव! पैकी ब्रम्हा सृष्टीचे निर्माते, विष्णु पालनकर्ते तर महेश संहारकर्ते. विश्वाचा मित्र व सहाययक सूर्य, कर्म घडविणारी मोहरुपी आदीशक्ती मनाचं नियंत्रण करणारी... हे पांचही ब्रम्हरुप ईश्वर म्हणजे "गण" या गणाचा पती म्हणजेच नेता.. गणपती!
निर्माता, संहार व पालन करणारा, कर्म घडविणारा, मनावर नियंत्रंण ठेवणारा गजानन म्हणुन तो पुर्णब्रम्ह व सर्वश्रेष्ठ आहे.
शंकराचं कैलास, इंद्राचा स्वर्ग, काशी व इतर क्षेत्रांचा नाश होऊ शकतो परंतु श्रीमयुरेश्वरक्षेत्र अविनाशी आहे. हे क्षेत्र पृथ्वीवर असुनसुध्दा स्वर्गापेक्षा जास्त पवित्र व शक्तीशाली आहे. स्वतःची निर्मिती स्वतः करण्याची शक्ती असलेलं सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेवाहुन मयुरेशक्षेत्र श्रेष्ठ असल्याचं अनेक वेदांनी व शास्रांनी सिध्द केलं आहे.
विश्वविलासिनी महामाया, जी सत्तेची मालकीन या अविनाशी क्षेत्रापासुन दूर होताच तिच्या हातून सत्ता गेली. विश्व सृष्टी निर्माण करायहा सत्ता मिळावी म्हणुन तिनं ध्यान करुन तपश्चर्या केली. तिच्या त्या तद्रुप भूमिकेलाच भूस्वानंदक्षेत्र ही संज्ञा प्राप्त झाली, तेच हे भूस्वानंद म्हणजेच मयुरेश्वरक्षेत्र. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न् होऊन ऐश्वर्यसंपन्न होशील असा गणेशाने "वर" दिला.
महाशक्ती असणारी सुखकर्ता, दुःखहर्ता गणेशाने भक्तांना दर्शन देण्याकरितां, त्यांना कार्य करण्याची स्फुर्ती व कार्यात यश देणारी सिध्दी मिळावी, स्वमहिमारुप, स्वयंज्योतिर्गमय, साक्षात सयंवेदब्रम्ह, स्वस्वानंद, मायाधिष्ठानरुप, स्वानंदब्रम्ह जे मयुरेश्र्वर या पवित्र जागु भक्तांच्या रक्षणासाठी येऊन राहिले
भूत्वानंद क्षेत्ररुप ठरलेली भूलोकावरील सर्वात जास्त आनंद देणारी व सृष्टीवर नियंत्रण ठेवणारी जागा म्हणजेच मोरगावचे मयुरेश्वरक्षेत्र!
वेदामधे शक्ती, सूर्य, विष्णु व शिव या चार उपासना करणार्या देवतांचा निवास भूस्वानंद क्षेत्राच्या चारही दाराजवळ आहेत. श्रीमयुरेश्वर क्षेत्राच्या चार दिशांना जी चार दारं आहेत त्याच्या ह्या देवता आहेत. साक्षात आत्मस्वरुप परब्रम्ह, ब्रम्हणस्पती म्हणजेच गणेश हा त्यांचा नायक!
ऋग्वेदामधे " मंद्रेरिंद्रहरी भिः या मंत्रामधे ही माहिती असुन ती प्रमाणसिध्द आहे. साक्षात्स्वसंवेद्यस्वरुप, स्वानंद महिमा, साक्षात्किरण ब्रम्हरुप असा हा स्वानंदलोक, त्याचेच प्रतिबिंब म्हणजेच श्रीभूस्वानंक्षेत्र किंवा मयुरक्षेत्र होय.
काही काळाने भाविकांच्या पातकामुळे देवतांना मालिन्य येऊ लागल्याने, स्वतःचे निर्मल्यत्व अक्षय रहावं म्हणुन गणेशाची प्रार्थना करुन मोरेगांव येथील मयुरेशक्षेत्री राहण्याची परवाणगी देवतांनी मागीतली. मयुरेश्वरक्षेत्री वास्तव्य झाल्याने सर्व देवतांचे पावित्र्य कायम राहिले. विश्वामधे काशी प्रयागादी क्षेत्रे प्रसिध्द आहेतच, ती सर्व मूलस्वरुपाने व पुर्णसामर्थ्याने मयुरेशक्षेत्री आहेत.
पंचेश्वराची उत्पत्ती झाल्यानंतर सामर्थ्यप्राप्तीसाठी पांच देवांनी आत्मस्वरुपाचे ध्यान करुन तपश्चर्या केल्याने ते गजाननाशी एकरुप झाले. ब्राम्हणस्पती स्वरुप गणेशाचा साक्षात्कार त्यांच्या ह्रदयात प्रगट झाला.
क्रमशः
संकलन - मिनाक्षी देशमुख.
श्री गणेश पुराण कथा (ड)*
*बल्लाळ विनायकाची कथा*
सोमकांत राजाने आदरणीय भृगु ऋषींना प्रश्न विचारला, “ऋषी महाराज, स्वतः मुद्गल ऋषी एवढे तपस्वी असून सुद्धा त्यांच्यावर गजानन प्रसन्न का झाला नाही? दक्षाने ऋषीएवढी तपश्चर्या केली नव्हती तरी त्याला गजानन प्रसन्न कसा झाला? भृगु ऋषी म्हणाले, “मी तुला दक्ष राजपुत्राची पूर्वजन्माची सर्व हकीकत सांगतो.”
सिंधू नावाचा एक देश होता. त्या देशात एक गाव होते. त्या गावाचे नाव होते पल्ली. या गावात फार वर्षापूर्वी एक वाणी राहत होता. त्याचे मोठे किराणा मालाचे दुकान होते. या वाण्याचे नाव होते कल्याण. तो नावाप्रमाणेच दुसऱ्याचे कल्याण करीत असे. तो रोज लक्ष्मीची पूजा करत असे. त्याला सात्विक पत्नी लाभली होती, तिचे नाव होते इंदुमती. अशा या दांपत्यास देवाच्या कृपेमुळे सुपुत्र लाभला. त्यांनी त्याचे नाव ठेवले बल्लाळ. बल्लाळला लहानपणापासून खेळण्यात मुळीच रस नव्हता. त्याला देवपूजा करण्यास फार आवडत असे. एके दिवशी बल्लाळाच्या मनात वेगळाच बेत होता. त्याने एक गोटा घेतला व त्याला गणपती असे सर्वांच्या साक्षीने नाव दिले. त्याला फुलांचा हार घातला व दुर्वाची जुडी वाहिली. नंतर सर्व बालसेनेने मिळून श्रीगणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली.
बल्लाळाच्या काही मित्रांच्या जन्मदात्यांना हा प्रकार आवडला नाही. ते बल्लाळाच्या वडिलांना त्याबद्दल बोलले. गावातल्या लोकांचे हे बोलणे ऐकल्यावर कल्याण अत्यंत संतापला. वेताची काठी घेऊन तो गावाबाहेर गेला. कल्याणाने कसलाही विचार न करता काटक्यांचे देऊळ, मंडप वगैरे सर्व काही दूरवर फेकून दिले. बल्लाळ तिथे शांत चित्ताने नेत्रकमले बंद करून श्री गजाननाचे ध्यान करीत होता. कल्याणने त्याला पकडले व छडीने त्याला यथेच्छ बडवून काढले. त्यानंतर एका झाडाला उलटे लटकावून ठेवले.हा सर्व प्रकार झाल्यानंतर कल्याण घरी निघून गेला. त्याने इंदुमतीला सर्व हकिकत सांगितली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
इकडे बल्लाळने श्रीगणेशाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. “समुद्रमंथनाच्या वेळी हालाहल विष शंकराने प्राशन केले त्या नीलकंठाचा व पतिव्रता पार्वतीचा तुम्ही सुपुत्र आहात. तुम्हाला प्रथम कोटी कोटी प्रणाम. आता माझ्यावर जे संकट आले आहे, त्याचे तुम्हीच निवारण करा. मी तुमच्या दिव्य दर्शनासाठी आतुर झालो आहे.” आपल्या पिताश्रींनी श्रीगजाननाचे देऊळ मोडून टाकले, हे लक्षात आल्यानंतर बल्लाळ रागावला व त्याने साक्षात् जन्मदात्याला शाप दिला, ‘माझ्या जीवाचे जीवन असणारे श्री गजाननाचे मंदिर ज्याने फेकून दिले, तो दृष्टिहीन होईल, तसेच बहिरा, मुका व कुबडा होईल. त्याच्या शरीरास दुर्धर रोग होऊन सर्वांगास दुर्गंध सुटेल. हे देवा श्रीगणेशा मी जर तुझी भक्तीमय अंतकरणाने पूजा केली असेल तर हा शाप खरा होऊ द्या.’
बल्लाळाच्या भक्तीवर श्रीगजानन प्रसन्न झाले. त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात बल्लाळास दर्शन दिले. श्रीगणेशाने बल्लाळला बंधनातून मुक्त केले. बल्लाळाने श्रीगणेशाला साष्टांग नमस्कार घातला व गणपती स्तोत्राच्या पठणास प्रारंभ केला. श्री गणेशाच्या कृपादृष्टीने बल्लाळाच्या सर्व जखमा बऱ्या झाल्या. त्याचे शरीर पूर्ववत झाले. लंबोदराने त्याला जवळ बोलावले व म्हणाले, “एवढ्याशा वयात तुझी गणेश भक्ती पाहून मी धन्य झालो. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तू दिलेला शाप खरा होईल. पुढील जन्मात त्याला त्याचे वडील घराबाहेर हाकलून देतील.”
बल्लाळ म्हणाला, “तुमचे दिव्य रूप माझ्या हृदयात राहू द्या व मुखामध्ये सदैव तुमचे नामस्मरण असू द्या. तुम्ही आता इथेच राहून लोकांवर प्रेमाचा वर्षाव करा. त्यांच्या प्रापंचिक अडचणी दूर करा.” गणपती म्हणाले, “जशी तुझी इच्छा! तू मला इथे राहण्यासाठी सस्नेह आमंत्रण दिले, त्यामुळे माझ्या आधी लोक तुझे नाव घेतील. मी बल्लाळविनायक या नामरूपाने प्रसिद्ध होईल. अनेक गणेशभक्त माझ्या दर्शनासाठी येतील.”
बल्लाळाने दिलेला शाप खरा झाला. त्या कल्याण वाण्याचे सर्व अंग बधीर झाले. त्याची वाचा गेली. तो दृष्टिहीन झाला. त्याला काही ऐकू येईना. त्याच्या शरीरात दुर्धर रोग झाला. इंदुमती ने मात्र त्यांची साथ सोडली नाही. इंदुमती आपल्या मैत्रिणींसह बल्लाळाला आणण्यासाठी गावाबाहेर आणण्यात गेली. तेथे गेली तर तिला वेगळेच दिसले. तिथे एक श्री गजाननाचे सुंदर मंदिर होते. बल्लाळ श्रीगणेशाची पूजा करत बसला होता. तिने धावत जाऊन आपल्या सोनुल्यास मिठी मारली व म्हणाली, “आता तू घरी चल. तुझे वडील फार आजारी आहेत. तू दिलेल्या शापामुळे हे सर्व झाले आहे. त्यामुळे तूच आता पिताश्री साठी काहीतरी उपाय शोधून काढ.” बल्लाळ म्हणाला, “पिताश्रींच्या हातून महापाप झाले. त्यामुळेच मी त्यांना शाप दिला. मला आता सर्व गोष्टींचे ज्ञान झाले आहे. त्यामुळे मी घरी येणार नाही. माझे जीवन श्रीगजाननाच्या चरणी अर्पण करणार आहे. त्यामुळे तू आता घरी जाऊन पती परमेश्वराची सेवा कर. तू सुद्धा गजाननाची भक्ती कर.”
इंदुमती म्हणाली, “याच्यासाठीच आम्ही तुला जन्म दिला का? तू शाप देताना थोडा तरी विचार करायला हवा होतास. आपल्या पिताश्रींना शाप दिल्यामुळे तुझे पुण्य नक्कीच क्षीण झाले आहे. वृद्धापकाळी आधार असावा म्हणून आई-वडील मुलांना जन्म देतात. पिताश्रीमुळे तुला हे निसर्गरम्य जग पाहायला मिळाले. तेव्हा त्यांच्या उपकारांची परतफेड कर. बल्लाळ म्हणाला, “मला क्षमा कर माते. मी चुकलो. मी तेथे येऊन सुद्धा उपयोग नाही. पुढील जन्मी त्यांचे कल्याण होईल. त्यांना राजकुळात जन्म मिळेल. त्यावेळी तुझे नाव कमला असेल. तुम्हाला भविष्यकाळात श्री गजाननाचे दर्शन नक्की होईल. त्याची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील.” ती भविष्यवाणी ऐकून इंदूमती घरी आली. बल्लाळाला आणण्यासाठी श्रीगणेशाने खास दिव्य विमान पाठवले. त्या विमानात बसून बल्लाळाने स्वर्गलोकी प्रस्थान केले.
*गणेश देवता व गणेशोत्सव स्वरूप*
हिंदू धर्मात गणपतीला (गणेश) फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पूत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.
ज्या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले त्या दिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटले जाते. त्यानंतर ११ दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला गणपतीच्या विसर्जनानंतर संपतो.
महाराष्ट्र, गुजरात आंध्रप्रदेशात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात ) गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची लहान मूर्ती आणली जाते व १० दिवस मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली जाते. सध्या तर परदेशस्थ भारतीय ही हा उत्सव मोठ्या दिमाखात तेथे साजरा करतात .
या काळात रोज सकाळी व संध्याकाळी त्याच्यापुढे आरती म्हटली जाते. मोदकाचा प्रसाद दिला जातो. ११ दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते.
१८९२ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली. पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जागृती निर्माण व्हवी हा हेतु त्यामागे होता. सरदार खाजगीवाले यांनी सर्वात प्रथम गणेशोत्सव ग्वाल्हेरला साजरा केला. गणपत घोवडेकर, भाऊ वैद्य, भाऊ रंगारी यांनी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ष्ठापना करुन हा उत्सव साजरा केला.
हे पाहून टिळक यांनी पुण्यात केसरीवाड्यात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर काही लोक दीड दिवसांनी, काही पाच, सात किंवा अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात.
गणपती बसल्यानंतर पाच दिवसांनी गौरींचे आगमन होते. त्या तीन दिवस राहतात. पहिल्या दिवशी आगमन दुसरे दिवशी भोजन व तिसरे दिवशी विसर्जन करतात साधारण पणे सातव्या दिवशी त्यांचेही विसर्जन केले जाते. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात.
यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक देखावे असतात. अनंत चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढून गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते.
पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवात मेळे ,नाटके संगीताचे कार्यक्रम जादूचे प्रयोग व्याख्याने कथाकथन व तत्सम करमणुकीचे कार्यक्रम होत असत सध्या यात बरेच बदल झाले असून स्पर्धा अर्केस्ट्रा डान्स लेझर शो असे विविध कार्यक्रम असतात एकंदरीत हा आनंदोत्सव असतो सर्वत्र पवित्र पण आनंदी व धार्मिक पवित्र वातावरण असते . हा एक धार्मिक , सांस्कृतिक व सामाजिक आनंदोत्सव च असतो सर्वत्र विद्युत रोषणाई व लोकसंगीत याची मेजवानीच असते हा उत्सव अबाल वृद्ध स्त्री पुरुष गरीब श्रीमंत सर्व दुःख विसरून यात सहभागी होतात। व आनंदी होतात .
गणेश नवसपूर्ती देवता ..
विवाह जुळून येण्यासाठी उपासना व उपाय ..
सध्या तरुण तरुणींचे विवाह होत नाहीत अनेक समस्या येत आहेत त्या हेतू गणरायाचे कृपेने हा सामाजिक प्रश्न समजून उपाय सांगत आहोत .सदर उपाय श्रद्धेने केल्यास निश्चित यश येऊ शकते असा भक्तांचा अनुभव आहे ..
श्री गणेश अथवा गणपतीला मंगलमूर्ती असेही नाव आहे आणि ते नाव यथार्थ आहे. कारण तो गणेश म्हणजे मंगल करणारा – साक्षात मंगलतेची मूर्ती आहे. कोणत्याही कार्यातली विघ्ने दूर करून ते कार्य पूर्ण करून देणार आहे. तेव्हा तो लग्नात विवाहात येणारी विघ्ने दूर करील, विवाह…ठरण्यात, जमण्यात, होण्यात, येणारे अडथळे निवारण करील यात काय शंका ? त्याची सेवा कोणत्याही प्रकारे केली, तरी विवाहात येणारे अडथळे दूर होतील व विवाह ठरून पारही पडेल, हे निश्चित तरी त्यापैकी आपण गणपतीचे काही मंत्र व तोडगे आता पाहू.
संकष्टी चतुर्थी करावी — या तोडग्याला कोणत्याही संकष्टी चतुर्थी पासून सुरुवात करावी. मात्र दिवसभर मीठ खाऊ नये. अळणी उपवास करून रात्री उपवास सोडताना देखील त्यात (भोजनात) मीठ नसावे. उपवास सोडण्याआधी एकवीस वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष वा श्री गणेश स्तोत्र म्हणावे. नंतर गणेशाची पूजा करून विवाहाबद्दल प्रार्थनाही करावी. हा उपाय करताना सोबत गणेश कवच धारण करून, विघ्नहर्ता धुपकाडी याचा वापर करावा. तसेच भ्रूमध्यावर मोहन तीलक लावावे.
रोज सकाळी बारा वाजण्याच्या आत गणपतीच्या कोणत्याही देवळात जावे. गणेशाचे दर्शन घेउन त्याला, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. पहिल्या दिवशी त्याला अभिषेक करावा. पूजा करावी, हा तोडगा विवाह होईपर्यंत दररोज अखंडपणे करावा. मंदिरात जाणे अभिषेक करणे शक्य नसल्यास स्फटिक गणेश, पारद गणेश मूर्ती घेऊन त्यावर अभिषेक करावा. ( जमल्यास प्रभावी कवच परिधान करावे.)
कोणत्याही गणेश मंदिरात अथवा आपल्या घरात स्फटीक अथवा पारद मूर्तीवर २१ दिवस रोज एकवीस वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. पहिल्या दिवशी संकल्प करून अभिषेक व पूजा करावी प्रार्थना रोज करावी.
बुधवारचे व्रत करावे. प्रथम संकल्प सोडून कोणत्याही बुधवारी हे व्रत सुरु करावे. एक चांदीचे छोटेसे ताट-ताटली घ्यावी. (ताम्हण घेऊ नये). त्यात कुंकवाने कींवा लाल चंदनाच्या गंधाने स्वस्तिक काढावे. त्या स्वस्तिकावर गणपतीची स्फटीक अथवा पारद मूर्ती ठेवावी. या मूर्तीची पूजा षोडषोपचारे करावी. त्यावेळी १०८ दुर्वा गणपतीला एका वेळी एक दुर्वा याप्रमाणे वाहाव्या. प्रत्येक दूर्वा वहातांना गणपतीचा “ओम गं गणपतये नमः” हा मंत्र अथवा “गणेश अष्टोत्तर शतनामावली” म्हणून दूर्वा वाहाव्यात. नंतर आरती करून गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. बुधवारी दिवसभर उपवास करावा. मीठ दिवसभर खाऊ नये. फळे, दूध व थंडपेय घेतली तरी चालतात. याप्रमाणे व्रताचरण विवाह ठरेपर्यंत चालू ठेवावे.
गणेश नवग्रह पूजन – एक चौरंग घ्यावा. पूजेच्या जागी साफसफाई करून रांगोळी वगैरे काढून ती जागा सुशोभित करून, तेथे चौरंग ठेवावा. त्या चौरंगावर लाल कपडा घालावा. हे कापड शक्यतो नवे असावे, नवे शक्य नसेल तर स्वच्छ धुऊन नीट वाळवलेले असावे. त्यावर गणपतीची एखादी मूर्ती ठेवावी. या गणेशाच्या मूर्तीच्या पुढील बाजूस नवग्रह म्हणून 9 सुपार्या ठेवाव्यात. तसेच एक कलश ठेवावा, त्यात पाणी भरून ठेवावे. आणि त्याच्या तोंडाशी आंब्याची पाच किंवा सात पाने व एक नारळ उभा ठेवावा. यानंतर कलश नवग्रह आणि गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करून षोडशोपचार पूजा करावी. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मग संकल्प करावा, (येथे स्वतःच्या नावाचा उच्चार करा.) नाम्न शीघ्र विवाह सिद्ध्यर्थे गणपती देवता प्रीत्यर्थे मंत्रजपम करीष्ये | संकल्प करताना पळीभर पाणी, थोडे तांदूळ / अक्षता , हळकुंड , सुपारी व तांब्याचे किंवा कोणतेही एक नाणे हे सर्व तळहातावर घेऊन वरील प्रमाणे संकल्प करताना पळीभर पाणी, थोडे तांदूळ अक्षता हळकुंड सुपारी व तांब्याचे किंवा कोणतेही एक नाणे हे सर्व तळहातावर घेऊन वरील प्रमाणे संकल्प विचारल्यानंतर पाण्यासह त्या सर्व वस्तू ताम्हणात घेऊन घ्याव्यात. नंतर तीन वेळा आचमन करावे. मग गणेशाच्या खालील मंत्राचा जप करावा.
ओम श्री गणेशम् वीघ्नेश वीवाहार्थे ते नम: l किंवा सालंकृत कन्या मे देही नमस्तयै गणेशाय नमः l या मंत्राचा जप रोज १०८ एवढा विवाह ठरेपर्यंत करावा.
गणेश पुराण या ग्रंथातील अध्याय १०९ ते १२५ अखेर नित्य वाचावे. हे अगदी अशक्य असेल, तर १०९ वा अध्याय आणि १२५ वा अध्याय तरी वाचावा . हेही शक्य नसेल तर १२५ वा अध्याय रोज वाचावा.
मुद्गगल पुराण या ग्रंथातील सहाव्या खंडातील ४० आणि एकेचाळीसावा अध्याय वाचावा.
प्रेमविवाह होण्यामध्ये काही अडथळे येत असतील किंवा अन्य कोणत्याही कारणाने विवाह जुळत नसेल, तर टिटवाळा येथील गणेशाचे दर्शन घेण्यास जावे. तेथे त्याची जमेल तशी सेवा करावी. शिवाय विवाह होऊन पुढे काही कारणाने संबंध दुरावल्यास ह्या गणेशाची सेवा करावी. मंगळ पीडा असलेल्यांचे विवाह याच्या दर्शनाने वा सेवेने होतात. या गणपतीचे नावच वर विनायक किंवा विवाह विनायक आहे. (टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा – ठाणे येथे आहे.)
अष्टविनायक यात्रा करावी, आणि प्रत्येक ठिकाणी विधिवत पूजा, अभिषेक वगैरे करून मनापासून विवाह साठी प्रार्थना करावी. नंतर विवाह होईतो रोज एकदा तरी अष्टविनायकाचे स्मरण करून प्रार्थना करावी. त्याचे दर्शन घ्यावे. (अष्टविनायकाच्या फोटोचे चित्राचे).
कोणत्याही गुरुवारी पुनर्वसु नक्षत्रावर रात्री बारा वाजता आंघोळ करून श्री गजानन महाराजांची पूजा करून संकल्प करून श्री गजानन विजय पोथी चा एक अध्याय वाचावा. त्यानंतर रोज एक अध्याय वाचावा. जोपर्यंत विवाह ठरून पूर्ण होत नाही, तोपर्यंत पारायणे करीत रहावे. विवाह झाल्यानंतर शेगावी जाऊन झुणका भाकर व हिरव्या मिरच्यांचा नैवेद्य महाराजांना दाखवावा. महापूजा करुन संकल्प पूर्ण करावा.
विवाह त्वरित होण्यासाठी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील २८ व्या अध्यायाचे पारायण लग्न होईपर्यंत अखंडित चालू ठेवावे. कोणत्याही रविवारी, मंगळवार, गुरुवार या वारी शुभ नक्षत्र असताना शुभ मुहूर्तावर हे पारायण सुरु करावे हे पारायण सुरु करावे. हे पारायण करताना प्रथम गणपती, शंकराचे, व दत्ताचे पूजन करावे.
गोरक्ष जालंदर चर्पटाश्च l अडबंगकानिफ मच्छिंन्दराद्या : l चाैरंगी रेवाणक भर्तरी संज्ञा l भूम्यां बभूर्वनवनाथ सिध्दा: ll
वरील श्लोक २१ वेळा म्हणून माझा विवाह त्वरित होण्यासाठी मी हा पाठ वाचण्यास सुरुवात करीत आहे. त्यात मला यश मीळू दे. अशी अंत:करणापासून प्रार्थना करून नवनाथांना नमस्कार करावा. गुलाबाचे अथवा चाफ्याचे फूल दत्ताच्या फोटो पुढे ठेवावे व अध्याय वाचण्यास सुरुवात करावी. विवाह पूर्ण झाल्यानंतर नऊ जणांना जेवू घालावे. त्यांना यथोचित दक्षिणा द्यावी व त्यांना नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घ्यावा.
हे सर्व उपाय संग्रहित आहेत केवळ गजाननाचे कृपेने अनेकांनी अनुभवलेले आहेत मी फक्त पुनर्मुद्रित करून आपले समोर ठेवलेत . श्रद्धेने हे करा व गजाननाचे कृपेने विवाह बद्ध व्हा .गणपती ही १४ विद्या व ६४ कला यांचा अधिपती असून गणांचा अधिपती आहे आपले कार्य निर्विघ्नपणे पार पडेल यात शंकाच नाही .
श्री सिद्धिविनायक चरणी समर्पित ...
*श्रीगणेश*
भाग--६.
पंचदेवांना ध्यानस्थितीत गणेशाचे जे दर्शन झाले ते प्रत्यक्षात घडावं अशी प्रार्थना केली, तेव्हा आकाशवाणी झाली की, गुरुच्या सानिध्यात गेल्याशिवाय योग्य ज्ञान व दर्शन होऊ शकत नाही. तरी भक्तश्रेष्ठ श्रीभ्रुशुंडीयोगांद्राच्या अमलाश्रमात जाऊन त्याला शरण जा.
पंचदेव अमलाश्रमांत श्रीभ्रुशुंडीचे दर्शन घेतल्यावर त्यांना समग्र गणेशज्ञान देऊन म्हणाले, "पंचदेव हो! जीथे आत्मस्वरुपाचं ध्यान केले त्यावेळी देवबलाने साक्षात्कार होऊन श्रीगणेशाचं दर्शन झाल तिथे परत जाऊन ध्यानात दिसलेल्या मूर्तीची स्धापना केल्यास गजाननाचं दर्शन होऊन कृतार्थ व्हाल."
वेदांनी सांगीतलेल्या भूस्वानंद अर्थात मयुरेशक्षेत्री मोरगांवला मुख्याधिष्ठान स्थळी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पंचेश्वरांनी गजाननाची मुर्तीप्रतिष्ठा केली. पांच महिण्याने माघ शुक्ल चतुर्थीला मयुरावर विराजमान असलेल्या गणेशाने प्रसन्न होऊन पंचश्वरांना सृष्टी व सत्ता दिली, माया म्हणजे मयुरा, तिच्यावर नियंत्रण ठेवणारा तो मयूरेश! पुढे या जागेला मोरगाव आणि मोरगांवचे क्षेत्राधिपती श्रीगजानन यांना मयूरेश नांव पडले.
मयूरेशक्षेत्राचे महात्म्य अमोघ, परिणामी, अतुल व फलदायी आहे. या विषयी एक कथा प्रसिध्द आहे. सुप्रतिक नांवाचा एक तरुण तिर्थयात्रेच्या निमित्ताने यात्रेकरुमधे मिसळुन त्यांना लुबाडणे, त्यांचा घात, खुण, दरोडे ही सर्व पापे तो करीत असे. एकदा चोरी करण्याच्या उद्देशाने यात्रेकरु मंडळीबरोबर पुराण कथा ऐकायला बसला असतां त्यावेळी स्कंद पुराणातील मयुरेशक्षेत्राचे महात्म्य सांगीतल्या जात होते. मयुरेशक्षेत्राच्या वर्णनात एवढी शक्ती आहे की, सुप्रतिकाच्या अंतःकरणात एकाएकी बदल झाला. त्याचा एकदम कायापलट झाला. पुराणिकांनी त्याला या क्षेत्राचं महात्म्य ऐकवल. आणि काय आश्चर्य! ज्याच्या ठीकाणी थोडीसुध्दा पुण्यबुध्दी उत्पन्न होण्याचा संभव नव्हता, त्या सुप्रतिकाने पश्चातापदग्ध होऊन मयुरेशक्षेत्री कायमचा आश्रय घेतला.
श्रीभ्रूशुंडीमहाराज व पंचदेव यांचा संवाद सुरु असतांना पंचदेवांनी विचारले, "इतर क्षेत्र विनाशी तर मग मोरेश्वरक्षेत्रच अविनाशी कसे?" गणेश जो स्वानंद, पुर्णब्रम्ह्य स्वरुप, त्याने स्वतःकरितां निर्माण केलेले असल्यामुळे हे मयुरेशक्षेत्र अविनाशी आहे. इथुनच इतर क्षेत्र व ब्रम्हाडांची निर्मिती झाली. याचा विनाश झाला तर सृष्टी पुनः निर्माण होणारच नाही. याच क्षेत्री योगिंद्रमहाराजांनी गणेशविजय नांवाचा ग्रंथ लिहिला.
गणेशाच्या निःश्वासापासुन उत्पन्न झालेले आदिगुरुस्वरुप असे वेद, गणेशाच्या आज्ञेवरुन पांच देवांना देण्यास सांगीतले असतां त्यांना दिव्यदृष्टी देऊन ब्रम्हसत्ता ज्योतीस्वरुप असे श्रीमयुरेश क्षेत्र दाखविले.
श्रीमयुरेश क्षेत्राचं साक्षात ब्रम्हस्वरुप वेदात व गणेशविजय ग्रथांत सुध्दा सांगीतले आहे. हे क्षेत्र सार्वभौमस्वरुपाचे, स्वयंभू व समर्थ क्षेत्र आहे. सर्व क्षेत्रांचे, सत्तेचे, क्षेत्रप्रकाशाचे मुळ हेच असुन ब्रम्हा विष्णु, शिव शक्ती सुर्यादी पंचेश्वरांनीही श्रेष्ठ मानले. श्रीमौदगल पुराणाच्या सहाव्या खंडात श्रीगणेशाने प्रसन्न होऊन समग्र क्षेत्रदेवतांना वरदान दिल्याचा उल्लेख आहे.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*मूर्तिशास्त्रानुसार गणेशरूप मोठे आव्हानात्मक व मोहविणारे असे आहे... साधारणतः गणेश पुराण व स्कंद पुराणातील वर्णनाप्रमाणे त्याचे रूप (मूर्ती) व चित्र असते. अर्थात, गुप्तेतर काळात गणेश प्रतिमांची संख्या व प्रकार वाढले. पाषाण, माती (मृत्तिका) याचबरोबर रुईचे (मंदार) खोड, चंदनाची मूर्ती, पोवळे, यासह मध्ययुगात हस्तिदंती, काष्ठशिल्प, आदींसह आधुनिक युगात पारदर्शक काचेच्या मूर्ती, फायबर, प्लास्टिक, तांदळावर कोरलेला आदी अनेक प्रकारात गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. यासाठी आपण सर्व गणेशभक्तांनी चित्रकार, मूर्तिकार, कलेच्या व मूर्तिकलेच्या विद्यार्थ्यांनी पुण्याच्या सारसबागेतील गणेश मंदिरामागील 'गणेश दर्शन संग्रहालयाला' जरूर भेट द्यावी. तेथे श्रीगणेशाची शेकडो रूपे आपणास पाहावयास मिळतील.....*
*स्कंद पुराणात (काशी खंड) वानर, सिंह व हत्ती अशा त्रिमुख व पंचमुख विनायकाचा उल्लेख आहे... याच पुराणातील माहेश्वर खंडात गणेशमूर्तीचे राजस, सात्त्विक, तामस असे वर्गीकरण येते. पाच तोंडे, दहा हात असलेला गणपती सात्त्विक व चार हातांचा, सोनेरी रंग असलेला राजस आणि निळ्या रंगाचा तामस वृत्तीचा गणेश आहे......*
*याचप्रमाणे गणेश पुराणात बाल गणपतीचे वर्णन आहे... चार युगांचे चार गणपती यात दिले आहेत ते पुढीलप्रमाणे :*
*१) कृतयुगातील गणेश 'विनायक' आहे. तो दशभुजा व सिंहारूढ असतो.....*
*२) त्रेतायुगातील गणेश 'मयुरेश्वर' असून, तो सहा भुजांचा मयूरारूढ (मोर) आहे.....*
*३) द्वापार युगातील गजानन चतुर्भुज असून, मूषक (उंदीर) हे त्याचे वाहन आहे.....*
*४) कलियुगातील धूम्रकेतू नामक गणेश मात्र द्विभुज असून, अश्व (घोडा) हे त्याचे वाहन आहे.....*
*मध्ययुगाच्या प्रारंभीच्या काळातील ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वरांनी सुरवातीलाच गणपतीची वंदना केली आहे... पल्लव, चोल काळातील अनेक गणेशशिल्पे मिळतात.....*
*सातव्या, आठव्या शतकातील थोडक्यात गणेशाचे प्रकार:*
*१. नृत्य गणेश- ब्रह्मपुराणात याचे वर्णन असून, आपल्या नृत्याने गणेशाने शिव-पार्वतीला प्रसन्न करून डोक्यावरील चंद्र व इतर आभूषणे व सर्व गणांचे आधिपत्य मिळविले होते. त्रिभंग (गुडघा, कंबर, खांदा- मानेत वाकलेली) अवस्था तोल, लय हे याचे वैशिष्ट्य. पायात घुंगरू व हाती वाद्येही असतात.....*
*२. शक्ती गणेश- थोड्याच (क्वचितच) या मूर्ती (मथुरेत) आहेत. आपल्या शक्तीला (देव) आलिंगन मुद्रेत मांडीवर घेऊन बसलेला या मूर्तीत दिसतो. झाशी (उत्तर प्रदेश) राणी महालात या मूर्ती आहेत. शक्ती (देवीचा) पाय सिंहाच्या पाठीवर ठेवलेला आहे. पुन्हा येथे सिंह हे शक्ती, राजसत्ता याचे प्रतीक आहे.....*
*३. पंचविनायक (गणेश)- स्कंदपुराणातील गजविनायकाचे हे रूप आहे. ओळीने पाच गणपती (शिलापट्टीवर) आहेत. त्यातील एक हत्तीरूपातील (गज) आहे.....*
*४. महागणपती, पंचमुख गणेश- नेपाळी कलेत ही मूर्ती मिळते. पाच सोंडी आणि दहा हात, हे महागणपतीचे लक्षण. चार बाजूंची गजमुखे व त्यावर अजून एक मुख, हे ढोबळ रूप. काशीतील धुंडिराज गल्लीतील बंगालच्या राणी भवानी मंदिरात ही प्रतिमा आहे. ही मूर्ती बरीच आधुनिक आहे.....*
*५. यक्षविनायक- पाच मुखे, पाच दात (सुळे लांब- एकदंत), मधल्या सोंडेच्या दातावर तीन बारीक हत्ती कोरलेले आहेत.....*
*६. राक्षसारूढ गणपती- पंचशुण्डा (सोंड), दशभुजा (बाहू- हात) गणपतीचाच हा प्रकार असून, तो द्विमुखी राक्षसाच्या खांद्यावर बसला आहे. दिल्लीच्या विमल सेठ यांच्या संग्रहात हे दुर्मिळ काष्ठशिल्प आहे.....*
*७. हेरंब गणपती- सिंहावर बसलेला अभय (आशीर्वाद) मुद्रेतील हा गणपती आहे. मुशीगंज (बांगलादेश) येथे तो मिळाला आहे.....*
*याशिवाय बाल गणपती, देवीच्या पायाखाली गजानन वा हस्तिमुख (गजमुख) पुरुष, उच्छिष्ठ गणपती, लक्ष्मी गणपती, ऊर्ध्व गणपती, पिंगल गणपती, भक्ती गणपती असे प्रकार आढळतात.....*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸भारताबाहेरील गणेश.🔸*
*गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते... भारतातच नव्हे तर जगभरात गणपतीची पूजाविधी व उपासना प्रचलित असल्याचे दिसून येते.....*
*भारताबाहेर अनेक देशांमध्ये गणेशमूर्ती सापडल्या आहेत... प्राप्त गणेशमूर्ती द्बिभूज व मोदकभक्षणरत आहेत. हातात मोदकभांडे, कुर्हाड, अंकुश, पाश, दंड, शूळ, सर्प, धनुष्यबाण दिसतात.....*
*गणपतीची उपलब्ध प्राचीनतम मूर्ती इसवीसनाच्या दुसर्या शतकात श्रीलंकेत निर्मिली गेली... जावा बेटाच्या वाडा नामक जागी इसवीसनाच्या अकराव्या शतकातील बसलेल्या स्थितीतील मूर्ती मिळालेली आहे. या मूर्तीवर तंत्रमताचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. इंडोनेशियामध्ये इतरत्रही गणपतीच्या आसनस्थ मूर्ती मिळालेल्या आहेत. यात खिचिड येथे मिळालेली मूर्ती सर्वाधिक सुंदर आहे. ही मूर्ती चतुर्भूज असून , अभंगदेह , सुंदर डोळे, नागजानवेधारी, वाहन उंदीर अशी आहे. चारपैकी तीन हातात अक्षसूत्र, विषाण, मोदकभांडे आहे, चौथा हात अस्पष्ट आहे.....*
*स्रोत: आंतरजाल, bookstruck.in*
*संमोहित झालेली व्यक्ती, संमोहन करणाऱ्या व्यक्तीच्या सर्वच आज्ञा ऐकते का ?*
*शाळेत कोणीतरी समोर संमोहनाचा प्रयोग करून दाखवला असेल.४-५ मुलांना बोलावून त्यांना संमोहित केले असेल. संमोहित केल्यानंतर त्यांना गाणी म्हणायला व नाचायला लावले असेल. एवढेच काय, उकडत असताना "काय थंडी आहे बुवा” असे म्हणायला लावून त्यांना कुडकुडायलाही लावले असेल.*
*हे बघून अगदी हसताहसता पुरेवाट झाली असेल. गंमतीचा कळस म्हणजे प्रयोग करणारा संमोहित माणसाला सांगतो की, “तुझ्या समोर अमिताभ बच्चन बसला आहे (प्रत्यक्षात तेथे एखादा टेबल असतो!) तेव्हा त्याची मुलाखत घे;" ती व्यक्ती खोट्या अमिताभची मुलाखतही घेते.*
*वरील उदाहरणांमुळे अशी भीती वाटणे रास्त आहे की, कोणी संमोहित केले, तर ती व्यक्ती सांगेल ते कराल. चोरी कर म्हटले की चोरी करावी लागेल वगैरे. वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या, ज्यात १ बाई साधुच्या मागे निघून गेली, अशा प्रकारेच काही लिहिलेले असते, त्यांचाही हातभार लागतो; पण हे खरे असते काय ?*
*संमोहनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे इच्छा नसल्यास कोणी ही संमोहित करू शकत नाही. कारण संमोहन करणारा काय म्हणतोय, काय करतोय यावर लक्ष केंद्रितच केले नाही, तर संमोहित होणार नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे संमोहनावस्थेत देखील माणूस त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटणार नाहीत, अशा गोष्टी कधीही करणार नाही. सुशील अशा सज्जन स्त्रीला अंगावरचे कपडे उतरवायला कोणी भाग पाडू शकणार नाही व सज्जन मुलाला कोणी चोरी करायला लावू शकणार नाही. त्यामुळे संमोहन करणाऱ्याला घाबरण्याचे कारण नाही.*
*मजा म्हणून त्याचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही.....*
*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन...*
|| ॐकारस्वरूपम शिवपुत्राय नमो नमः ||*
*|| ॐ गं गणपतये नमः ||*
*|| जय गणेश ||*
हे मंगलमूर्ती श्रीगजानना! विनायका! शिवपार्वतीसुता!
प्रथम आम्ही तुझ्या चरणांना मनोभावे वंदन करतो. तुझ्या प्रेरणेनेच आम्ही ग्रंथारंभ केला आहे. कार्यसिद्धीसाठी तू आम्हाला मंगलमय आशीर्वाद दे.
श्रीगणेश हा शिव-पार्वतीचा सुपुत्र होय. श्रीगणेशास सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. तो सुखकर्ता, दुःखहर्ता आहे. अशा या विनायकाचे पुराण पृथ्वीतलावर ऐकण्यास दुर्लभ आहे. तुम्ही सर्वजण भाग्यवंत आहात त्यामुळे ही सुवर्णसंधी तुम्हाला मिळाली आहे. गणेश पुराणाचे वाचन, श्रवण केल्याने यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य याची प्राप्ती होते. आम्हाला श्री गणेश जशी प्रेरणा देईल त्या प्रमाणे आम्ही हे गणेश महात्म्य तुम्हाला सांगणार आहे. आपण ते शांतचित्ताने, भक्तीमय अंतकरणाने, श्रद्धापूर्वक वाचावे ही नम्र विनंती. हे पवित्र पुण्यकारक गणेश पुराण प्रथम महर्षी व्यासांनी भृगूंना, भृगुनी सोमकांत नृपास व सोमकांत राजाने हे सर्व लोकांना सांगितले. उद्यापासून आपण उपासना खंडातील काही कथा बघणार आहोत.
नमस्कार!
गणपतीच्या दहा दिवसात (किंवा आयुष्यभरासाठी) आपण एक छोटासा नियम पाळणार आहोत. सकाळी अंघोळ झाली कि प्रत्येकाने खालील *संकटनाशक गणेश स्तोत्र* म्हणायचे आहे. कोणाच्या घरी सव्वा दिवसाचा गणपती असो अथवा पाच किंवा दहा दिवसाचा असो ,आपण हा नियम निदान दहा दिवस काटेकोरपणे पाळणार आहोत.
*|| संकटनाशन गणेश स्तोत्र ||*
प्रणम्यं शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ।।१।।
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ।।२।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।३।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ।।४।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो ।।५।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६।।
जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८।।
।।इति श्री नारदपुराणे संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम्।। श्रीगजाननार्पणवस्तू: ||
*श्री गणेश पुराण कथा*
॥ श्री गणेशाय नम: ॥
*सोमकांत राजाची कथा*
सौराष्ट्र देशात देव नगरामध्ये फार फार वर्षापूर्वी सोमकांत नामक एक सत्वशील राजा होऊन गेला. तो वेदज्ञानी, धर्मनिष्ठ व प्रजादक्ष होता. त्याच्याजवळ कुबेराला ही हेवा वाटेल एवढे ऐश्वर्य होते. अशा या राजाचे पाच विश्वासू प्रधान होते. विद्याधीश, रूपवान, क्षमंकर,सुबल, ज्ञानगम्य अशी त्या पाच प्रधानांची नावे होती. हे सर्व प्रधान राजाप्रमाणे चतुरस्त्र होते. त्या सोमकांत राजास सत्वशील, सुविद्य, पतिव्रता पत्नी लाभली होती. सुधर्मा असे त्या राणीचे नाव होते. अशा या दांपत्यास देवाच्या कृपेमुळे एक बुद्धिमंत सुपुत्र लाभला होता. त्याचे नाव हेमकंठ. अशा या धर्मनिष्ठ ,प्रजादक्ष सोमकांत राजाला अचानक पूर्व कर्माप्रमाणे भयंकर कुष्ठरोग झाला. मनुष्याने केलेल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ त्याला व्यक्त किंवा अव्यक्त रुपाने त्याच जन्मी किंवा पुढील जन्मी मिळत असते.
कुष्ठरोगामुळे राजाला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. राजास वाटू लागले की आता आपल्या जीवनात रस नाही. त्यामुळे एके दिवशी राजाने आपले विश्वासू प्रधान ,सुपुत्र व प्रियतमा ला बोलावले व त्यांना आपली दुःखमय कहाणी सांगितली. सोमकांत राजा म्हणाला, “मी आजपर्यंत धर्माप्रमाणे आचार, विचार, उच्चार केले. मला पूर्वजन्मातील कर्म भोगावे लागत आहे. खरोखरच मानवी शरीर हे क्षणभंगुर आहे. केव्हा कोणता रोग या शरीरात उत्पन्न होईल हे काही सांगता येत नाही. या महारोगामुळे मला हे आयुष्य नकोसे झाले आहे. लोक कुचेष्टा करतात. त्यामुळे मला लोकांपुढे जाण्यास लाज वाटत आहे. मी आता ठरवले आहे की राजकुमार हेमकंठास राज्याभिषेक करून त्याच्याकडे संपूर्ण राज्यकारभाराची जबाबदारी सोपवायची. त्यानंतर मी वनात जाऊन परमेश्वराचे चिंतन करणार आहे.” राजाची प्रियतमा सुधर्मा म्हणाली, “स्वामी मी अग्नीसाक्षीने तुमच्याबरोबर विवाह केला आहे. तुम्हाला सर्वस्व अर्पण केले आहे. मी तुमच्या शिवाय राहू शकणार नाही. माझे पती परमेश्वर जिथे असतील तिथे मी येणार.”
आपल्या पिताश्रींचा दृढनिश्चय पाहून हेमकंठाने राज्यकारभार चालवण्याचे ठरवले. राजा हेमकंठास काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू लागला, “सदैव दुसऱ्याच्या कल्याणासाठी झिजावे. स्वतःचा स्वार्थ पाहू नये. दुसऱ्याची निंदा करणे किंवा त्याचा छळ करणे हे महापाप आहे. स्त्री, पैसा, मानसन्मान या गोष्टी लोकांपासून लपवून ठेवाव्या. अपेयपान करू नये. मुक्या प्राण्यांना ठार मारून त्यांचे मांस भक्षण करू नये व परधन, परस्त्रीबद्दल आसक्ती असू नये. सदैव धर्माप्रमाणे आचरण करावे हे लक्षात ठेव. राज्यकारभार करताना कोणी स्तुती करतील, तर कोणी निंदा करतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. राज्यकारभार करताना सदैव ईश्वराचे स्मरण असावे. यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या सहा गुणांची वृद्धी करावी. तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या सहा दोषांपासून दूर रहावे.” अशा प्रकारे हेमकंठास सोमकांत राजाने एकांतात राजनीतीचा उपदेश केला.
त्यानंतर सोमकांत राजाने क्षेमकर, रूपवान व विद्याधिश या तीन प्रधानांना बोलावून राज्याभिषेकाची जय्यत तयारी करण्यास सांगितले. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी सात पवित्र नद्यांचे पाणी आणले होते. राज्याभिषेकासाठी ब्राह्मण, नातेवाईक, मित्रमंडळी, देशोदेशीचे राजे आदींना निमंत्रणे देण्यात आली. प्रथम श्री गजाननाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुण्याहवाचन, मातृकापूजन, अभ्युदय, गंगार्पण इत्यादी धार्मिक विधी झाले. त्यानंतर सोमकांत राजाने स्वतःच्या करकमलानी हेमकंठाच्या मस्तकावर सुवर्ण राजमुकुट ठेवला. राज्याभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर सोमकांत राजाने ब्राह्मणांचे यथाविधी पूजन केले.
त्यानंतर सोमकांत वनवासात जाण्यासाठी निघाला. आपला अन्नदाता आपल्याला सोडून वनवासात चालला आहे हे कळल्यावर प्रजेला दुःख झाले. आपल्या जन्मदात्याचा विरह हेमकंठास सहन होईना. राजाने पुन्हा पुन्हा विनंती करून त्या लोकांना समजावले. हेमकंठाचा कंठ दाटून आला. हे बघून राजा सोमकांत म्हणाला, “आता तू माझी आज्ञा मानून नगरात परत जा व राज्यकारभार कर. तू पित्याची आज्ञा मोडता कामा नये. माझ्या या पाच प्रधानांनपैकी तीन प्रधानांना तुझ्याबरोबर ठेवतो. ते तुला मार्गदर्शन करतील. प्रजेचे प्रेमपूर्वक पालन कर. मी केलेल्या राजनीति प्रमाणे आचरण कर. मी जर पूर्ववत झालो, तर नक्की राज्यात परत येईल. तू काही काळजी करू नकोस.” आपल्या पिताश्रींच्या जड अंतकरणाने निरोप घेऊन त्यांच्या चरणांना वंदन करून हेमकंठ राजा आपल्या नगरीत जाण्यासाठी निघाला. नगरात जाण्याआधी हिमकंठाने आपल्या जन्मदात्रीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मदात्यांची आज्ञा मानून हेमकंठ पुन्हा आपल्या राज्यात आला. राजपुत्र पुन्हा राज्यात आल्याने सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. आपल्या वडिलांनी सांगितलेल्या राजनीतीप्रमाणे हेमकंठाने राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.
हेमकंठास राज्याकडे पाठवल्यानंतर सोमकांत सपत्नीक, सुबल व ज्ञानगम्य या दोन विश्वासू प्रधानांसह निबीड वनात गेला. चौघेही एकमेकांच्या विचाराने वागत होते. प्रधान अरण्यात सुधा राजास मान देत होते. आपली पावले झपाझप पुढे टाकत ते एका सरोवराच्या तीरावर आले. त्या भागात अनेक ऋषी मुनींचे आश्रम होते. त्यांनी आश्रमासाठी निसर्गरम्य जागा निवडली होती. त्या आश्रमातले ऋषींचे शिष्यगण तसेच ऋषी सुद्धा सरोवरातील मधुर पाणी व कमळे नेण्यासाठी येत असत. त्यांना येथे मुक्त वातावरण लाभले होते. आपण जणू काही स्वर्गातच आलो आहोत असे त्यांना वाटत होते.
खूप चालून चालून सोमकांत राजाचे पाय दुखत होते. त्यामुळे त्याची प्रियतमा त्याचे पाय चेपीत बसली. त्यानंतर दोन्ही प्रधान पोटपूजेचा बंदोबस्त करण्यासाठी कंदमुळे व सुमधूर फळे आणण्यासाठी अरण्यात निघून गेले. सोमकांतला झोप लागली. सुधर्मा मात्र जागीच होती. तिला तळ्याजवळ एक पिळदार शरीरयष्टी असलेला तेजस्वी ऋषिकुमार दृष्टीस पडला. त्याला बघताच सुधर्मा चा आनंद गगनात मावेना. हा तेजस्वी महात्मा आपले कल्याण करण्यासाठी येथे आलेला आहे असे तिला वाटले. सुधर्माने त्या तेजस्वी ऋषीपुत्रास हाक मारली. तो ऋषिकुमार सुधर्माकडे आला व त्याने तिला वंदन केले. सुधर्मा म्हणाली, “हे तेजस्वी ऋषीपुत्रा तू कोण आहेस?” तिचा प्रश्न ऐकून ऋषिकुमार म्हणाला, “हे माते! माझे नाव चवण आहे. माझ्या पिताश्रींचे नाव भृगु ,मातोश्री चे नाव पुलोत्तमा आहे. कृपया आपला परिचय द्यावा. सुधर्मा म्हणाली, “हा पुरुष म्हणजे सोमकांत राजा होय. मी त्याची धर्मपत्नी सुधर्मा. सोमकांत राजाच्या पूर्व कर्मामुळे त्याला कुष्ठरोग झाला आहे. विवाहनंतर त्यांना कुष्ठरोग झाला आहे. आता या भयंकर रोगातून माझ्या पतीचा उद्धार कसा होईल हे मला समजत नाही.” सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून चवणास वाईट वाटले. तो तेथून काहीही न बोलता गेला व आपल्या कलशात जल भरून आश्रमात आला.
आपल्या पिताश्री समोर त्याने तो पाण्याने भरलेला कलश ठेवला व खाली मान घालून उभा राहिला. आपल्या सुपुत्राचे काहीतरी बिनसले आहे, त्याला कसलेतरी दुःख झाले आहे हे भृगु ऋषींनी ओळखले. चवनाने जन्मदात्यास सोमकांत राजाची सर्व हकीकत सांगितली. भृगू ऋषी म्हणाले, “अरे, तू यामुळे एवढा दुःखी का झालास? त्या सर्वांना घेऊन तु आश्रमात ये. आपण त्यांचे दुःख निवारण करू.” पिताश्रींच्या आज्ञेनुसार चवन पुन्हा सरोवरापाशी आला. भृगुपुत्र चवन सुधर्मास म्हणाला, “हे राजनंदिनी! माझ्या पिताश्रींनी आपणासर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे.” चवनाचे हे संभाषण ऐकून सुधर्मास आनंद झाला. ते पाचही जण ऋषींच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. अशाप्रकारे ती सर्व मंडळी ऋषींच्या आश्रमात आली. त्यांच्या शिष्यांनी सोमकांत राजा ,सुधर्मा राणी व दोन प्रधानांचे सहर्ष स्वागत केले. आश्रमात सर्वत्र वेदघोष सुरू होता. आश्रमात अनेक हिंस्त्र पशु सुद्धा होते. ते एकमेकांशी हाडवैर विसरून मुक्तपणे हिंडत होते. तेथे सुशितल पवन होता. त्या आश्रमात भृगुऋषी व्याघ्रचर्मवर शांत चित्ताने बसले होते. त्यांची मुद्रा तेजस्वी दिसत होती. त्यांचे दर्शन झाल्यावर सर्वांनी त्यांना नमस्कार केला. भृगु ऋषींनी सर्वांना मंगलमय आशीर्वाद दिले.
नंतर सोमकांत राजा पुढे आला व हात जोडून नम्रपणे म्हणाला, “हे मुनिवर, आपली कीर्ती त्रैलोक्यात पसरली आहे. माझे भाग्य थोर म्हणून आज मला आपले दिव्य दर्शन झाले. स्वामीजी माझ्याकडे कशाची कमतरता नव्हती. मी माझ्या जीवनात सदैव सत आचार, सत विचार, सत उच्चाराचे पालन केले. मी शंभू महादेवाची भक्ती सुद्धा केली. असे असून सुद्धा मला कुष्ठरोग झाला. आपणच मला या दुर्धर व्याधीतून मुक्त करा. आपण शिग्रतेने काहीतरी उपाययोजना करावी. मला या रोगाचा कंटाळा आला आहे. काही काही वेळा आत्महत्या करावी असे वाटते, पण आत्महत्या पाप आहे याची जाणीव असल्याने मी मनाला समजावतो. आता तुम्हीच मला या दुर्धर रोगापासून मुक्त करा, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे.”
सोमकांत राजाची विनंती ऐकून तपस्वी भृगु ऋषी म्हणाले, “राजन, तू काळजी करू नकोस. आपल्या सर्वांचे काळजी घेणारा परमेश्वर आहे. त्याच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. मला तुझे परम दुःख कळाले आहे. माझ्याकडे त्यावर जालीम औषध सुद्धा आहे. हे सर्व तुला पूर्वजन्मीच्या भयंकर पापामुळे भोगावे लागत आहे. ईश्वर सर्वांना सर्व कर्माची फळे व्यक्त-अव्यक्त रूपात देत असतो. मनुष्याने सदैव ईश्वराचे स्मरण करावे. त्यामुळे त्याच्या हातून नेहमी चांगलीच कर्मे होतात. तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या शत्रूंवर विजय मिळवता आला पाहिजे. तू पूर्वजन्मी कोणते महापाप केले होतेस, हे मी तुला दिव्य दृष्टीने सांगेन. तू आता निवांत हो.” भृगु ऋषींच्या संभाषणाने सुधर्मास हायसे वाटले. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजन झाल्यानंतर सर्वजण निद्राधीन झाले. सोमकांत राजास झोप केव्हा लागली हे सुधर्मास कळले सुद्धा नाही. एवढा परमानंद सोमकांत राजास राजवाड्यात असताना सुद्धा झाला नव्हता.
त्या रात्रीनंतर भृगु ऋषी प्राप्त:काळी उठले. त्यांनी आपल्या एका शिष्याकडून सोमकांत राजास बोलावले आणि आपल्या दिव्य दृष्टीने सोमकांत राजाचे पूर्वजन्माचे चरित्र सांगण्यास प्रारंभ केले. ते म्हणाले, “फार फार वर्षापूर्वी विंध्यपर्वता जवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. या नगरीत एक धनाढ्य वैश्य राहात असे. त्याचे नाव होते चिद्रूप. त्याला सुविद्य, सुशील, पतिव्रता प्रियतमा लाभली होती. तिचे नाव शुभगा. त्यांना खूप वर्ष झाली तरी मुलबाळ नव्हते. त्यांना देवाच्या कृपेमुळे वृद्धापकाळी एक पुत्र लाभला. त्यांनी त्याचे नाव कामंदा ठेवले. त्याच्या आई-वडिलांना त्याचे फार लाड केले. त्याला लाडाने वेडे केले. त्याने आई-वडिलांच्या संमतीशिवाय एका तरुणीशी विवाह केला. ती तरुणी दिसायला लावण्यवती होती. त्यांनी आपल्या लाडक्या सुनेचे नाव कुटुंबिनी असे ठेवले. ती पतिव्रता होती. अशा या थोर पतिव्रता स्त्रीस सात पुत्र व पाच कन्या लाभल्या. या मुळे चिद्रूप व त्याच्या पत्नीस आनंद झाला. ते दोघेही वृद्धपणी नातवंडांच्या बाललीलात रमू लागले. काही दिवसांनी दोघेही गतप्राण झाले.
आई-वडिलांच्या निधनानंतर सर्व संपत्ती कामंदाच्या हाती आली. कामंदाला संपत्तीचा गर्व झाला. त्याने अविचाराने संपत्ती उडविण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्या धर्मपत्नीने त्याला खूप समजावून सांगितले, पण त्याने ऐकले नाही. थोड्या दिवसातच कामंदा संपत्तीरहित झाला. तो अनेक प्रकारची कट-कारस्थाने करू लागला. लोकांना फसवू लागला. तो अपेयपान करू लागला. अशा या स्त्रीलंपट, लबाड कामंदाच्या हरकती मुळे जनता त्रस्त झाली. कामंदा विरुध्द नृपाकडे तक्रार केली. त्याची शिक्षा म्हणून राजाने कामंदास नगराबाहेर हाकलून दिले. त्याने अरण्यात मुक्काम ठोकला.
अरण्यात येणाऱ्या वाटसरूंना लुटून तो ठार मारत असे. तो अरण्यातील पशु पक्षांना ठार मारून आपले पोट भरू लागला. असे करता करता त्याच्या जवळ अमाप संपत्ती जमा झाली. त्याने अरण्यात मोठे घर बांधले. हाताखाली दहा गुंडांना कामासाठी ठेवले. त्यांच्या हातून अनेक ब्रम्हहत्या झाल्या होत्या. त्याच्या तारुण्याचा जोम हळूहळू कमी होऊ लागला. त्याने प्रौढत्वात पदार्पण केले. प्रौढत्वात सुद्धा त्याने अनेक लोकांची निर्घृण हत्या केली. निसर्ग नियमाप्रमाणे त्याने प् प्रौढत्वातून वार्धक्यात पदार्पण केले. वार्धक्यात त्याला धड चालता येईना, बोलता येईना. हात पाय थरथरू लागले. त्याच्या नोकर-चाकराना, तसेच पुत्रांना, मित्रमंडळींना हा केव्हा एकदा देवाघरी जातोय असे वाटू लागले. त्याला अचानक एका ब्राह्मण सख्याची आठवण झाली. त्या सख्यास सांगून इतर ब्राह्मणांना कामंदाने आपल्या घरी बोलावले.
त्याने ब्राह्मण समुदायास प्रथम नमस्कार केला व म्हणाला, “हे ब्राह्मण जनहो, माझ्या हातून अनेक पापे झाले आहेत. मला मरणापूर्वी पुण्यकर्म करायचे आहे. त्यामुळे मी आपणा सर्वांना शंभर सुवर्णमुद्रा दान करणार आहे.” त्या ब्राह्मण समुदायातील दोन ब्राह्मण म्हणाले, “शिवं शिवं! अरेरे ! तुझ्यासारख्या महापापी चांडाळाकडून आम्ही दान स्वीकारणार नाही.” ब्राह्मणांकडून नकार मिळाल्यानंतर कामंदास आपल्या हातून केवढे महापाप झाले आहे याची जाणीव झाली. कामंदा ज्या अरण्यात राहत होता, त्या घनदाट अरण्यात एक श्री विनायकाचे जुने देऊळ होते. ते देऊळ खूप वर्षापूर्वींचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार करून आपण पुण्यप्राप्त करावे असे कामंदाने ठरवले. त्यानंतर ताबडतोब आपल्या जवळ असलेल्या सर्व पैशांनी जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. त्यांनी अत्यंत मनमोहक मंदिर बांधले. अशाप्रकारे कामंदाचे होते तेवढे बहुतेक धन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात खर्च झाले. उरलेले सर्व धन नातेवाईकांनी पळवून नेले. नातेवाईकांना मानसन्मानाची, पैशाची अपेक्षा असते. जरा काही चूक झाली की ते पिसाळलेल्या सिंहाप्रमाणे भांडण्यासाठी येतात. मनुष्याने परमेश्वराची थोडीजरी भक्ती केली तरी तो परमेश्वर आनंदित होतो. त्याला शुद्ध प्रेमाची अपेक्षा असते.
काही महिन्यानंतर कामंद देवाघरी गेला. प्रथम यमदुतांनी त्याला चाबकाचे फटके दिले, दगडांनी मार मार मारले, उकळत्या तेलाच्या कढईत फेकून दिले. यमाने चित्रगुप्तास विचारले कि याचे पापपुण्य किती आहे? चित्रगुप्ताने आपल्या नोंदवहीत पाहिले व सांगितले, याचे पाप खूप आहे, त्यामानाने पुण्य थोडे आहे. यमाने कामंदास विचारले की, प्रथम पुण्य भोगणार की पाप भोगणार लवकर सांग. कामंदा म्हणाला, यममहाराज मला प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा आहे. त्यामुळे यमाने त्याला सौराष्ट्र देशातील राजघराण्यात जन्माला घातले. तोच महापापी कामंदा म्हणजे तू आहेस राजन. तुझ्या पुण्याईमुळे तुला हा जन्म लाभला आहे.” हि पूर्वजन्मीची कथा भृगु ऋषींनी राजास सांगितली.
भृगु ऋषींनी आपल्याला खोटेच सांगितले असे सोमकांत राजास वाटू लागले. तेवढ्यात एक अद्भुत चमत्कार झाला, अचानक घारी सारखे मोठे पक्षी येऊन सोमकांत राजास आपल्या चोचीने मारू लागले. ऋषी म्हणाले, “हे राजन, ऋषीमुनी असत्य भाषण करीत नाही. असे असताना तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, त्यामुळे हे पक्षी तुला त्रास देत आहेत.” असे म्हणून ऋषींनी एकदा हुंकार देताच ते पक्षी निघून गेले. त्यानंतर सोमकांत राजाने भृगु ऋषींना साष्टांग नमस्कार करून त्यांची क्षमा मागितली. तपस्वी, महाज्ञानी भृगु ऋषींनी नंतर क्षणभर ध्यान केले. या ध्यानामध्ये त्यांनी सोमकांत राजाच्या पूर्व कर्माचे अवलोकन केले व पुढे म्हणाले, “हे राजन, तुझे पूर्वजन्मीचे पाप खूप आहे. तू पूर्वजन्मी अनेक महापापे केली आहेस. त्यामुळे ती सर्व पापे नष्ट करण्यासाठी कोणताही उपाय उपयोगी पडणार नाही. पण एक रामबाण उपाय आहे. तू पुण्यमय गणेश पुराणाचे भक्तीमय अंतकरणाने श्रवण केल्यास पापक्षालन होईल, यात काहीही शंका नाही. तो श्री गणेश सुखकर्ता आहे तसेच दुःखहर्ता आहे”
असे म्हणून भृगु ऋषींनी आपल्या कमंडलूस स्पर्श करून एक सहस्त्र गणेशाचे नावे उच्चारली. त्यानंतर त्या कमंडलूतील मंतरलेले जल सोमकांत राजाच्या अंगावर शिंपडले. त्यानंतर राजाच्या नासिकाग्रातून एक अत्यंत सूक्ष्म पुरुष बाहेर पडला. थोड्याच कालावधीत तो एवढा वाढला की त्याची उंची सात वृक्ष पेक्षा जास्त झाली. तो माणूस अत्यंत काळाकुट्ट होता. त्याच्या मुखातून रक्त,पु यांसारखे अनेक पदार्थ बाहेर येत होते. हा अक्राळविक्राळ मनुष्य आपणास यमलोकी पाठवणार असे त्यांना वाटू लागले. भृगु ऋषी घाबरले नाहीत. त्यांनी मोठ्या धिराने त्या मनुष्यास विचारले, “हे राक्षसा, तू कोण आहेस?” तर राक्षस म्हणाला, “मी पुण्यपुरुषांचा जुळा भाऊ पापपुरुष आहे. मी प्रत्येक मनुष्याच्या शरीरात राहत असतो आणि सात्विक आचरणाचे माणसे असतात ती माझ्या भावाचे ऐकतात. जी राजस आचरणाची माणसे असतात ती आमच्या दोघांचेही ऐकतात व जी पापी माणसे म्हणजे तामसी आचरणाची माणसे असतात ती फक्त माझे ऐकतात. माझ्या ऐकल्यामुळे अनेक पापी लोकांचा नाश झाला आहे. आपल्या मंत्र प्रभावाने मी राजाच्या शरीरातून बाहेर आलो.” त्या राक्षसाचे बोलणे ऐकून भृगू ऋषी म्हणाले, “आता मी सांगतो तेथे जा. पुन्हा येथे येऊ नकोस. समोर जो आम्रवृक्ष आहे त्याच्या ढोलीत जाऊन बस व झाडांची वाळलेली पाने खाऊन पोट पूजा कर.” राक्षस गेला त्याने आम्रवृक्ष स्पर्श करताच त्या झाडाचे भस्म झाले. त्यावर भस्माच्या ढिगात तो लपून बसला.
हे पाहून ऋषी म्हणाले, “राजन, तू अतिशय पुण्यकारी पुण्यवर्धक श्री गणेश पुराण शांतचित्ताने श्रवण कर. म्हणजे त्या दिव्य पुण्याइने आम्रवृक्ष पूर्ववत होईल व तू पापातून मुक्त होशील.” सोमकांत राजा म्हणाला, “मुनीवर, मी श्रीगणेश पुराण कोठेही पाहिले नाही किंवा श्रवण सुद्धा केले नाही. मी श्री गणेश पुराण ऐकण्यासाठी कोणाकडे जाऊ? याचे तुम्ही मार्गदर्शन करा.” ऋषी म्हणाले, “हे वत्स ! तुला श्रीगणेश पुराण श्रवण करण्यासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. पूर्वी विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवांनी हे पुण्यमय पुराण महर्षी व्यासांना सांगितले. मी स्वतः महर्षी व्यासांकडून श्रवण केले आहे. तुझी तीव्र इच्छा असेल तर मी ते सांगण्यास तयार आहे. पण तू ते श्रद्धापूर्वक ऐकले पाहिजे. प्रथम तू सरोवरात जाऊन स्नान करून ये.” त्यानंतर सोमकांत राजा सरोवरावर गेला. तेथे स्नान केले. ओंजळीत जल घेऊन सूर्यनारायणाच्या साक्षीने गणेश पुराण श्रवण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर ते जल सरोवरास अर्पण केले. त्या संकल्पामुळे राजाचा दुर्धर असा कुष्ठरोग ताबडतोब बरा झाला. आसनावर बसल्या नंतर सोमकांत राजा म्हणाला, “श्रीगणेश पुराण खरोखरच दिव्य आहे. ते ऐकण्याचा मी आज संकल्प केला व ताबडतोब माझे शरीर रोगमुक्त झाले. शिवपार्वतीसुत खरोखरच सुखकर्ता व दु:खहर्ता आहे.” ऋषी म्हणाले, “बरे झाले तुझी तुलाच खात्री पटली.हे पुण्यमय श्रीगणेश पुराण जे वाचतील वा श्रवण करतील त्यांची जन्मजन्मांतरी पापे नष्ट होऊन जातील. त्यांच्या घरात सुख, शांती, समाधान नांदेल. या गणेश पुराणाचे श्रवण वाचन केल्यामुळे कलियुगात मनुष्यप्राणी भवसागरात तरून जाईल. त्यामुळे मी आता गणेश पुराण सांगण्यास प्रारंभ करतो.”
भृगू ऋषी सांगू लागले, “नारायणाच्या एका अंशापासून महर्षी व्यास निर्माण झाले. महर्षी व्यास महान तपस्वी तसेच ज्ञानी सुद्धा होते. त्यांनी एका वेदाचे चार विभाग केले. ते चार विभाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. हे चार वेद मनुष्याने समजावून घेतले पाहिजेत ,त्यांनी वेदाचे ज्ञान समजावून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी त्यांनी पुराने रचण्यास सुरुवात केली. त्यांना ज्ञानाचा गर्व झाला होता. आपल्यासारखा ज्ञानी पुरुष या त्रैलोक्यात कोणीही नाही असे त्यांना वाटू लागले. पुराने रचण्यापूर्वी आपली दिव्य रचना निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून त्यांनी श्री गजाननाचे किंवा इतर कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली. त्यांना आपण पुढे काय लिहावे हे सुचेना. त्यांना स्मृतिभ्रंश होऊ लागला. काही आठवेना.
याचे कारण विचारण्यासाठी ते विश्वनिर्माणकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी थोडा विचार केला व म्हणाले, “हे वत्सा ! कोणतेही कार्य हाती घेण्यापूर्वी त्याचा सर्वांगाने विचार केला पाहिजे. कोणत्याही कार्य करताना मनामध्ये नम्रता असावी. गर्वाने कोणत्याही कार्यास सुरुवात केल्यास अनेक विघ्नांचा सामना करावा लागतो. आपण त्रैलोक्यात ज्ञानी आहोत असा तुला गर्व झाला होता, त्यामुळे शारदा तुझ्यावर चिडली व तुझी मती कुंठीत झाली. तू कोणतेही कार्य करण्यापूर्वी मंगलमूर्ती श्री गजाननाचे स्मरण करत जा. श्री गणेश सहस्त्रनामावलीने गणेशाची पूजा करत जा. श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे. कोणत्याही कार्याच्या प्रसंगी, प्रथम श्री गणेशाचे पूजन करणे आवश्यक आहे. त्याला सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. प्रत्येक मनुष्याने रोज स्नान केल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र किंवा श्री गणेश सहस्त्रनामावली म्हणणे आवश्यक आहे. ज्या मनुष्यावर मंगलमूर्ती प्रसन्न असतो, त्याच्यावर सर्व देवदेवता संतुष्ट असतात. आता तू आश्रमात जाऊन प्रथम श्री गणेशाचे पूजन कर. त्याच्या कृपेने तुझी बुद्धी पूर्ववत होऊन तुला पुराण लिखाणास प्रारंभ करता येईल.” ब्रह्मदेवांचा उपदेश ऐकल्यानंतर श्री महर्षी व्यास म्हणाले, “हे करुणासागरा, माझी मती कुंठित झाल्याने मला स्मृतिभ्रंश झालेला आहे. त्यामुळे हा शिवपार्वतीसुत श्रीगणेश कोण? त्याचे सहस्त्रनाम कोणकोणती आहेत? त्याच्या वेगवेगळ्या भक्तांच्या कथा सुद्धा आपण मला सांगाव्यात. त्याने घेतलेल्या विविध अवतारांबद्दल सुद्धा मला सर्व काही सांगा.”
*आरती झाल्यावर "यज्ञेन यज्ञमयजन्त" हा मंत्र "ॐ स्वस्ति साम्राज्यं" इत्यादि मंत्रपुष्पांजली झाल्यावर त्या त्या देवांच्या गायत्री म्हणण्याचा प्रघात आहे... त्यामध्ये प्रामुख्याने गणपती, सूर्य, देवी, शिव, विष्णु या पंचायतन देवता, ब्रह्माविष्णुमहेश तसेच महाकालीमहालक्ष्मीसरस्वती हे देवतात्रय, सद्गुरू दत्तात्रेय, नवग्रह, मत्स्यकूर्मादि दशावतार, हनुमान, नवनाथ इत्यादि देवता यांचा समावेश होतो. गायत्रीसंग्रहात कित्येक शत गायत्री सांगितलेल्या आहेत. त्यात नेहमी उपयोगी पडणाऱ्या काही निवडक गायत्री खाली दिलेल्या आहेत.....
*१. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ।।*
*२. भास्कराय विद्यहे मद्ध्युतीकराय धीमहि । तन्नो आदित्यः प्रचोदयात् ।।*
*३. दैव्यै ब्रह्मण्यै विद्यहे महाशक्त्यै च धीमहि । तन्नो देवी प्रचोदयात् ।।*
*४. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि । तन्नो रुद्रः प्रचोदयात् ।।*
*५. नारायणाय विद्यहे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णुः प्रचोदयात् ।।*
*६. वेदान्तनाथाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णुः प्रचोदत्*
*७. कात्यायन्यै विद्यते कन्याकुमार्यै धीमहि । तन्नो दुर्गा प्रचोदयात् ।।*
*८. महालक्ष्म्यै विद्यहे विष्णुपत्न्यै च धीमहि । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ।।*
*९. प्र णो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती । धौनामवित्र्यवतु ॥*
*१०. आंजनेयाय विद्यहे वायुपुत्राय धीमहि। तन्नो वीरः प्रचोदयात् ।।*
*११. नृसिंहाय विद्यहे वज्रदन्ताय धीमहि । तन्नो नृसिंहः प्रचोदयात् ।।*
*१२. कश्यपात्मजाय विद्यहे लघुरूपाय धीमहि । तन्नो वामनः प्रचोदयात् ।।*
*१३. जामदग्न्याय विद्यहे रेणुकात्मजाय धीमहि । तन्नः परशुरामः प्रचोदयात् ।।*
*१४. दशरथात्मजाय विद्यहे सीतावराय धीमहि । तन्नो रामचंद्रः प्रचोदयात् ।।*
*१५. दशरथात्मजाय विद्यहे उर्मिलेशाय धीमहि । तन्नो लक्ष्मणः प्रचोदयात् ।।*
*१६. जनकात्मजायै विद्यहे भूमिपुत्र्यै च धीमहि। तन्नो जानकी प्रचोदयात् ।।*
*१७. देवकीनन्दनाय विद्यहे वासुदेवाय धीमहि । तन्नः कृष्णः प्रचोदयात् ।।*
*१८. भीमकात्मजायै विद्यहे कृष्णकान्तायै धीमहि । तन्नो रुक्मिणी प्रचोदयात् ।।*
*१९. महाज्वालाय विद्यहे अग्निमन्नाय धीमहि । तन्नो वह्निः प्रचोदयात् ।।*
*२०. तत्पुरुषाय विद्महे स्वर्णपक्षाय धीमहि । तन्नो गरुडः प्रचोदयात् ।।*
*२१. दत्तात्रेयाय विद्यहे अवधूताय धीमहि । तन्नो दत्तः प्रचोदयात् ॥*
*२२. परब्रह्मणे विद्यहे गुरुदेवाय धीमहि । तन्नो गुरुः प्रचोदयात् ।।*
*२३. हंसहंसाय विद्यहे परमहंसाय धीमहि । तन्नो हंसः प्रचोदयात् ॥*
*२४. भागीरथ्यै च विद्यहे विष्णुपद्यै च धीमहि। तन्नो गङ्गा प्रचोदयात् ।।*
*२५. भास्कराय विद्यहे दिवाकराय धीमहि। तन्नः सूर्यः प्रचोदयात् ।।*
*२६. क्षीरपुत्राय विद्यहे अमृतत्वाय धीमहि। तन्नश्चद्रः प्रचोदयात् ।।*
*२७. अङ्गारकाय विद्यहे भूमिपुत्राय धीमहि। तन्नो मङ्गलः प्रचोदयात् ।।*
*२८. सौम्यगुणोपेताय विद्महे अप्रतिमरूपाय धीमहि । तन्नो बुधः प्रचोदयात् ।।*
*२९. बृहस्पतये विद्महे देववंद्याय धीमहि । तन्नो गुरुः प्रचोदयात् ।।*
*३०. भार्गवाय च विद्महे दैत्यवंद्याय धीमहि । तन्नः शुक्रः प्रचोदयात् ।।*
*३१. कोणस्थाय च विद्महे सूर्यपुत्राय धीमहि । तन्नः शनैश्वरः प्रचोदयात् ।।*
*३२. सिंहिकात्मजाय विद्यहे महावीर्याय धीमहि । तन्नो राहुः प्रचोदयात् ।।*
*३३. तारकाग्रहमस्तकाय विद्यहे रौद्रात्मकाय धीमहि । तन्नः केतुः प्रचोदयात्*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
*🔸गणपतीचे अध्यात्मिक महत्व.🔸*
*वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |*
*निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||*
भाद्रपद शुध्द चतुर्थीला महासिध्दी विनायकी असे म्हणतात... त्यादिवशी ‘गणपती बाप्पा मोरया’ हा आवाज सर्वत्र ऐकायला मिळतो. ‘मोरया’ म्हणजे नमस्कार. त्या दृष्टीने पाहता, ‘गणपती बाप्पा मोरया’ चा अर्थ गणपती बाप्पाला नमस्कार असा होतो.....*
प्रत्येक शुभकार्यात सर्वप्रथम श्रीगणेशाचे पुजन केले जाते... गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा, पण अग्रपूजन हे गणपतीचेच झाले पाहीजे. पौराणिक कथा आहे की, अजाणता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला जो कोणी प्राणी प्रथम दिसेल त्याचे शिर आणण्यास सांगितले. पार्षदाला सर्वप्रथम हत्ती दिसतो व पार्षद हत्तीचे मस्तक घेऊन येतो. गणपतीच्या धडावर ते मस्तक ठेऊन गणपती बाप्पाला जिवंत केले जाते व आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गजानन, गणेश, गणराज अशा विविध नावाने ओळखला जाऊ लागतो.....*
गणपती बाप्पाला हत्तीचे मस्तक लावण्यात एक वैशिष्टय आहे... हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वांहून अधिक बुध्दीमान प्राणी आहे. गण-पती म्हणजे समुहाचा नेता होय. ह्याप्रमाणे नेता व तत्ववेत्ता ह्यांच्या जीवनात बुध्दीची तेजस्विता व समाजाला योग्य मार्गाने नेण्याची अभिलाषा असणे गरजेचे असते.....*
गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात... बारीक सुई देखिल जमिनीवरुन उचलण्याएवढी सूक्ष्म दृष्टी हत्तीची असते. मानवानेही स्वत:ची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवले पाहिजे. हत्तीचे लांब नाक (सोंड) दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते. नेता व तत्ववेत्ता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे, याचे ही सोंड सूचक आहे.....*
गणपतीला दोन सुळे असतात... एक पूर्ण व दुसरा अर्धा असतो. पूर्ण सुळा श्रध्देचा व अर्धा सुळा बुध्दीचा प्रतिक आहे.....*
*गणपती बाप्पाला चार हात असतात... एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक व चौथ्या हाताने गणपती बाप्पा आपणास आशीर्वाद देतात.....*
.गणपती बाप्पाला लंबोदर असे सुध्दा म्हणतात... सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वत:च्या विशाल उदरात साठवून ठेवल्या पाहिजेत ह्याची सूचना त्याचे मोठे पोट देते.....*
गणपतीचे पाय लहान असतात त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही... म्हणजेच कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये. जसा ससा व कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतो तसे हळूहळू पुढे जाणाऱ्याचे कार्य सुदृढ व सफल बनत जाते.....*
गणपतीचे वाहन उंदीर आहे. गणपतीचे वाहन इतके लहान असण्याचे कारण म्हणजे उंदीर हा त्याला घराघरात घेऊन जातो... महापुरुषाची साधने अशी लहान व नम्र असली पाहिजेत. जेणेकरुन ते घराघरात प्रवेश प्राप्त करु शकतील व सर्वांसाठी प्रिय बनू शकतील. गणपतीचे वाहन उंदीर हे मायेचेही प्रतिक आहे. उंदराप्रमाणे मायादेखिल मानवाला फुंकर मारुन चावत असते. फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेऊ शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. गणपतीचे वाहन उंदीर आपल्याला फार सूचक गोष्टी समजावते.....*
*गणपतीला दुर्वा फार आवडतात... लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही, असे गवत त्याने आपले मानले व त्याचे मूल्य वाढविले. नेता आणि तत्त्ववेत्ता ज्यांना काही महत्त्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करुन जीवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरे, दूर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही. रंगविरहीत, सुगंधविरहीत; ज्याची जगाच्या दृष्टिने काही किंमत नाही असे कर्मदेखिल प्रभुचरणावर प्रेमाने वाहिले तरी त्याला आवडते.....*
*गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल अधिक प्रिय आहे... लाल रंग हा क्रांतीचा सूचक आहे. शिवाय गणरायाला आपण तांदूळ वाहतो. तांदुळाला संस्कृतमध्ये ‘अक्षता’ म्हणतात. अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा; जो खंडीत नाही तर अखंड आहे. देवाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचे दर्शन अक्षता वाहण्यात आहे.....*
गणपतीला ‘वक्रतुंड’ म्हणतात... ऋध्दिसिध्दीपासून मुख फिरवून राहणाऱ्यालाच ऋध्दिसिध्दी मिळतात. वाकडे तिकडे चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड.....*
आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर आपल्या इंद्रियाचा एक गण आहे... आणि या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिध्दीस न्यायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की, मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे; ज्याच्यामुळे काही विघ्ने येऊ नये व कार्य सरळपणे पार पडावे.....*
गणेश-चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचे विसर्जन आपण अनंत चतुर्दशी-दिवशी करतो... जे सान्त आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात व सगुणाला निर्गुणात विलीन करतो.....*
अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकरें ॥*
*‘अ’ कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, ‘उ’कार म्हणजे विशाल पोट आणि ‘म’कार म्हणजे त्याचे मस्तक... अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती व मंगलमूर्ती गणेश, नेता व तत्त्ववेत्ता ह्यांचे आदर्श स्वरुप आहे.....*
*अर्चना जोगळे...*
*🔸गणपती बाप्पा🔸*
*पाहूणा तरी कसा म्हणू रे तुला गणेशा? तू तर आम्हा लोकांच्या मना- मनांत कायम घर करून आहेस. तूच तर करता करविता, आरंभ देवता, विघ्नहर्ता.*
*नव्याने कोणत्याही गोष्टीची सुरुवात करावयाची म्हटले की सर्वात पहिल्यांदा तुझीच मूर्ती डोळ्यापुढे ठेवून श्रीगणेशा होतो, आम्हाकडून. आनंदाच्या वेळीसुद्धा तुझ्याच पुढे साखर ठेवावी वाटते सर्वप्रथम. आणि संकटाच्या वेळीही तुझीच तर आठवण होते. तुझ्याच नावाचा घोष असतो मनात. तूच तर देतोस बळ अडचणींवर मात करण्यासाठी. म्हणूनच ना रे तूच सुखकर्ता आणि दुःखहर्ताही.*
गजानना, गेली दहा दिवस तू येऊन उपकृत केलयंस पाहुणा या नात्याने घराघरात. ते सुद्धा किती खोलवर रुजलाएस तू आमच्या मनात? हे तपासून बघण्यासाठीच ना? अगदी जवळून आमच्या सुखदुःखाशी, आनंदाशी एकरूप होण्या साठीच ना? घडेल तशी सेवा, घडेल तसा नेवेद्य स्वीकारण्यासाठीच ना?*
हे ओंकारा, एकाच वेळी घराघरांत प्रवेशता झालास, तेंव्हापासून नुसता उत्साह ओसंडून वाहत आहे आमचा. उत्सवी वातावरण निर्मिती करत, आम्हा सर्वांच्या आनंदाला उधाण आणले आहेस तू अगदी!*
मयूरेश्वरा, तुझ्या साक्षीने कितीतरी शुभारंभाच्या गोष्टी घडल्या. केवढी तरी खरेदी झाली. केवढ्या तरी व्यवहाराचा भागिदार बनलाएस आमचा तू! आणि कितीतरी जणांचं साकडं ऐकून घेतलंस तूच.*
फार त्रास दिला का रे अमेया, आम्ही तुला? तुझ्या निमित्ताने म्हणून लहान थोरांसाठी कितीतरी उपक्रम राबवले आम्ही. त्यांचा मनमुराद आनंद लुटला आम्हीच. आमच्यातील कलागुण प्रदर्शित करत विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले तुझ्याच संगतीने. त्यांना वाव मिळवून दिला तुझ्याच समोर. डिजे आणि गाण्यांच्या कर्णकर्कश आवाजाने उबग येऊन परतीचा जाण्याचा दिवस जवळ तर केला नाहीस ना तू विनायका? अशीही शंका डोकावतेय मनात.*
एकदंता, तू आलास तसा प्रत्येकाच्या आनंद व्यक्त करण्याच्या नाना तह्रां तू सहन केल्यास खऱ्या. तुझे कान सुपाएवढे म्हणून काहीही आणि कितीही ऐकून घेण्याची तुझी ही सवय. पण आम्हाला कधी कळणार रे, की हे नाहीच आहे योग्य ते? दे रे बाबा तूच आता अशा लोकांना सुबुद्धी जाता जाता. पण 'तुझ्यासाठी प्रसाद' या नावाखाली आमच्या जिभेचे चोचले भरपूर पुरवून घेतले आम्ही साऱ्यांनी भालचंद्रा.*
दरम्यानच्या काळात गौराई आल्या. त्यावेळी छोट्या बालकाप्रमाणे पुरवलेले तुझे लाड, आम्हाला आमचे बालपण आठवते करवून गेले. गौराईंना निरोप देताना, 'मी येईन काही दिवसात'. हा तू दिलेला शब्द पाळण्याची तुझी वेळ अगदी समीप येऊ घातली आहे.*
बाप्पा आज तुझ्या निरोपाचा दिवस. आम्हाला हुरहूर लावणारा, रिकामा रिकामा वाटवणारा आणि ' पुनःश्च कामाला लागा' हे सुचवणारा.*
*पण खरं सांगू लंबोदरा, तुझे रिकामे मखर आवरून ठेवताना राहून राहून आवंढे येतात रे या घशात. डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा घरातील प्रत्येक जण लपवण्याचा प्रयत्न करतो, पण लपतील तर शपथ! खरच दहा दिवस आमच्या सान्निध्यात येऊन आम्हाला सहवास घडवणारा, आमच्या सुखदुःखात एकरूप होणारा आणि आनंदात सोबत करणारा तो तूच एकमेव चिंतामणी. तूच मोरया नि तूच सिद्धेशा.*
हे वक्रतुंडा, तुझ्या येण्याने आलेले उत्साहाचे भरते तुझ्या निरोपाने रिते करून जातोएंस तू विघ्नेशा.*
*नावं कोणतीही घेतली तरी एकमेव मंगलमूर्ती आहेस तो तूच. हे कसे विसरू आम्ही गणनायका. आम्ही केवळ एवढेच म्हणू शकतो गजमुखा, की आमचा उद्याचा गजर हाच असणार आहे,*
*गणपती बाप्पा मोरया ।*
*मंगलमूर्ती मोरया।*
*पुढच्या वर्षी लवकर या।*
*बाप्पा लवकर या।*
*🔹लेखक: अज्ञात...🙏*
*🔸परिवर्तिनी एकादशी.🔸*
भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते... प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होते. परिवर्तिनी एकादशीला काही शुभ योग जुळून येत आहेत. परिवर्तिनी एकादशीचे व्रताचरण, पूजनविधी, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया.....*
आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मासाचा सात्विक काळ हा व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांसाठी विशेष करून ओळखला जातो... चातुर्मासाचा प्रारंभ आणि सांगता एकादशीच्या व्रताने केली जाते. चातुर्मासातील पहिल्या श्रावण महिन्यात व्रत-वैकल्यांची अगदी रेलचेल असते.....*
गोकुळाष्टमीनंतर सर्वांना वेध लागतात गणेश चतुर्थी म्हणजेच ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे... प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते.....*
आषाढी एकादशीपासून श्रीविष्णू शयन करतात, अशी मान्यता आहे... म्हणूनच याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. हा काळ कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला श्रीविष्णू शयनावस्थेत असताना कूस बदलतात. यामुळे विष्णूंच्या स्थानात बदल होतो, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.....*
यासाठी या एकादशीचे व्रत महत्त्वाचे मानले गेले आहे... परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्यप्राप्ती होते. या एकादशीला केलेल्या श्रीविष्णू पूजनामुळे मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले जाते.....*
*स्रोत: मराठी न्यूज, आंतरजाल...*
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय १७ वा*
दुसरा दिवस उजाडला. कानिफ गोपीचंदाला म्हणाला, "राजा, जालंदरनाथांना कोठे पुरले ती जागा दाखव." राजा म्हणाला "चला मी दाखवतो!" कानिफने राजाबरोबर आपल्या शिष्यांना पाठविले. ते ती जागा पाहून आले. कानिफ म्हणाला, "राजा, जालंदरांना बाहेर काढण्यापूर्वी तुझ्यासारखे दिसणारे पाच पुतळे करून आण. सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंडाचे पुतळे बनव." राजाने कारागिराकडून हुबेहूब पुतळे घडविले. ते पुतळे घेऊन राजासह कानिफ, जालंदराला जेथे पुरले होते त्या जागी आला. त्याने राजाला "एक कुदळ घेऊन त्या जागी जमिनीवर घाव घाल" असे सांगितले. पण त्या आधी सोन्याचा पुतळा त्या जागेच्या बरोबर वरती ठेवण्यास सांगितले. राजाने पहिला कुदळीचा घाव घातला तोच आतून जालंदराने रागाने ओरडून विचारले, "कोण खणतोय?" राजा म्हणाला, "मी गोपीचंद राजा खणतोय." ते शब्द राजाने काढले तोच कूपावर ठेवलेला होता तो सोन्याचा पुतळा जळून गेला. राजा घाबरला. मग कानिफाने रुप्याचा पुतळा ठेवून खणायला सांगितले. तेव्हा पण त्या पुतळ्यावर जालंदराच्या रागाचा परिणाम झाला व तो जळून गेला. मग तांबे, पितळे व लोखंड यांचे पुतळेही क्रमाने जळून गेले. कानिफाने राजाला खुणेने जवळ बोलावले व म्हटले "आता जरा वेळ थांब. मग पुन्हा कुदळीचा घाव घाल. कोण म्हणून विचारले की मी सांगेन." राजाने जमीन उकरण्यासाठी पुन्हा जरा वेळाने कुदळ उचलली.
च्या तेवढ्या वेळात कूपात जालंदर विचार करू लागला, 'चार-पाच वेळा मी संतापाने गोपीचंद राजाचे भस्म करण्याचा प्रयत्न केला पण तो मेला नाही हे मोठे नवल आहे. आता तो जर असला तर, समोर दिसताच तो चिरंजीव होईल.' इकडे 'चिरंजीव' मंत्राने भस्म भारून कानिफाने राजाच्या कपाळाला फासले, मग तो म्हणाला, "घाल घाव!" राजाने कुदळ मारली. आतून जालंदराने विचारले, "अजून कोण हा कुदळ मारतोय?" तेव्हा पटकन कानिफ म्हणाला, "गुरूजी, मी तुमचा बालक कानिफ. गोपीचंद राजाला घेऊन आलोय. त्याला जमीन उकरायला सांगितली आहे. गुरूजी तुम्हाला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे." ते शब्द ऐकताच जालंदराचा राग कोठच्या कोठे मावळला. त्यालाही कानिफाला भेटायची उत्कंठा लागली. "गोपीचंद राजा चिरंजीव होवो" असा आशीर्वाद त्याने दिला.
सेवकांना बोलावून भराभर जमीन खणण्याचे काम चालू झाले कुदळीचे घाव वज्रास्त्रावर पडले व खणखण असा आवाज आला. तेव्हा आतून जालंदराने इंद्राख योजून वखाख मोकळे केले व स्वतः जालंदर बाहेर आला. कानिफ व जालंदर अगदी प्रेमाने भेटले, गोपीचंदाने जालंदराला साष्टांग दंडवत घातले. तेव्हा जालंदर म्हणाला. "बाळा तू दैवयोगाने वाचला आहेस. आता तू सूर्यचंद्र असेपर्यंत अमर होशील!" जालंदराने मैनावतीचे, गोपीचंदाचे व कानिफाचे सांत्वन केले. मग तो गोपीचंदाला म्हणाला, "राजा! आता तू ठरव. तुला हे नश्वर राज्य व भोग हवेत की विरागी व्हायचे आहे? हे राज्य व ही संपत्ती क्षणिक आहेत. वैराग्यांचा मार्ग व भोगाचा मार्ग दोन्ही तुला मोकळे आहेत. तुझा तू विचार कर!"
गोपीचंद विचार करू लागला. "आज अकरा वर्षे खोल गर्तेत जालंदर जिवंत राहिला, यमाला याने नमविले आणि मला हा भस्म करून टाकणार होता. पाच पुतळे याच्या इच्छेमुळे जळाले. माझे राज्य वैभव म्हणजे याच्यापुढे चोथा, याने देऊ केलेले वैराग्याचे वैभव म्हणजे कायमची चिंता मिटवणारे आहे. गोपीचंद म्हणाला, "महाराजा आता मला इथले काहीच नको. आपण मला आपल्यासारखे करावे." जालंदर म्हणाला, "नीट विचार कर, ठाम बचन दे!" राजा म्हणाला, "अगदी निर्धाराने सांगतो, मला आपला म्हणावे. मी शरण आहे." तेव्हा जालंदराने आपला हात त्याच्या पाठीवर फिरवला व डोक्यावर ठेवला. मुखाने शाबासकी दिली. त्याचे शरीर डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. त्या कृपादृष्टीने राजा रोमांचित झाला. मग त्याच्या कानात जालंदराने मंत्रोच्चार केला. सर्व जग कसे नाशवंत आहे याची राजाला खात्री पटली. काया व दृश्य पदार्थ सर्व माया आहे असे दिसले. मोह नष्ट झाला. मन विनयशील झाले. मग जालंदराने वडाचा चीक लावून त्याच्या केसांच्या जटा वळल्या, त्याला कौपीन नेसविली. त्याच्या कानावर मुद्रा काढल्या. शैली, कंथा, भस्माची झोळी हाती दिली. शिंगी, कुबडी, भिक्षेची झोळी हाती दिली. त्याचे संपूर्ण परिवर्तन झाले. जालंदराचा हात हाती घेऊन तो प्रेमाने "नाथ नाथ!" असे म्हणू लागला.
ही बातमी अंतःपुरात गेली. त्यामुळे स्त्रीवर्गात एकच हाहाः कार उडाला. खिया शोक करू लागल्या. जालंदराने गोपीचंदाला प्रथम आपल्याच राज्यात, आपल्याच राजवाड्यासमोर, आपल्याच खियांकडे "माई, भिक्षा वाढा हो!" असे म्हणून भिक्षा मागण्यास सांगितले. वैराग्याची त्याची कसोटी घ्यायलाच हवी होती. ज्यांच्या मोहाने राजाने जालंदराला पुरले होते, त्यांच्या समोर बैरागी होऊन भिक्षा मागितली पाहिजे. गोपीचंदाने त्याचप्रमाणे भिक्षा मागण्यास प्रारंभ केला, तेव्हा मात्र त्याला पाहून खियांनी फारच दुःख केले. पाहाणारे लोक हवालदिल झाले पण, गोपीचंद अचल होता. गुरूची आज्ञा मानणे हेच त्याचे काम होते. लुमावंती आणि इतर खिया त्याच्या भोवती गोळा झाल्या. त्याला म्हणू लागल्या, "तुम्ही आमच्याजवळ संसार करणार नसलात तर आमचे काही म्हणणे नाही, पण आमच्या डोळ्यांसमोर तरी रहा. तुम्हाला एक पर्णकुटी बांधून देऊ. आम्हाला दर्शनसुख तरी मिळावे. आम्ही तुमची सेवा चाकरी करू.!" पण राजाचे त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. खिया सारख्या प्रश्न विचारीत होत्या व गोपीचंद योगातील गूढ उत्तरे देत होता. पुन्हा त्याने भिक्षा मागितली तर मिक्षा न घालता त्या रडत रडत जवळ येऊ लागल्या. तेवढ्यात मैनावतीने शिजवलेले अन्न आणले. संन्यासिनी आई व विरक्त राजा हाच भिक्षेकरी. अपूर्व दृश्य होते ते ! ती भिक्षा घेऊन गोपीचंद जालंदराकडे गेला व सर्व प्रकार सांगू लागला. तेवढ्यात मैनावती पण तिथे आली. तिनेही तेच सांगितले.
जालंदर व कानिफ, मैनावती व गोपीचंद यांनी त्यानंतर नाथपंथातील योगविद्येसंबंधी तीन दिवस खूप चर्चा केली. गोपीचंदाला जालंदराने सांगितले, "राजा, हा देश सोडून तू बद्रिकाश्रमाला जा. लोखंडाच्या काट्यांवर उभा राहून तेथे तू बारा वर्षे तप कर." राजा लगेच जायला निघाला. आपले सर्व राजवैभव सोडून गोपीचंद राजा खरोखरीच बद्रिकाश्रमाला जाणार हे ऐकताच सर्व प्रजाजन दुःखाने व्याकूळ होऊन त्याला निरोप देण्यासाठी हेलापट्टण नगराच्या सीमेपर्यंत गेले. लुमावंती राणीचा पुत्र मुक्तचंद याला मंत्र्यांनी त्यानंतर राजपद दिले. जालंदराने त्याचा राज्याभिषेक केला. राजाच्या सर्व सरदारांना व मंत्र्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रे व भूषणे देऊन त्यांचा गौरव केला. "मुक्तचंदाच्या आज्ञेत रहा" असे सर्व स्त्रियांना सांगितले. मैनावतीला गोपीचंदाप्रमाणेच मुक्तचंदाची काळजी घेण्यास सांगितले. नंतर जालंदर, कानिफ व त्याचे शेकडो शिष्य सहा महिने तेथे राहिले व त्याने राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.
*श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
देवांतक आणि नरांतक*
अंग देशात रौद्रकेतू आणि शारदा हे दाम्पत्य राहत होते. त्यांना दोन जुळे पुत्र झाले. ब्राह्मणाने आपल्या पुत्रांची देवांतक आणि नरांतक अशी नावे ठेवली. नारद ही जिज्ञासेने त्यांना पाहण्यासाठी आले. रौद्रकेतूने त्यांचे यथोचित स्वागत केले. आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या चरणावर घातले व म्हणाले, “हे ब्रह्मर्षी! माझ्या पुत्रांना आयुष्य व आरोग्य लाभावे, ते पराक्रमी व किर्तीमान व्हावेत म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या.” रौद्रकेतूच्या विनंतीवरून नारदाने त्यांच्या दोन्ही पुत्रांना नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. ‘त्यांची त्रिभुवनात कीर्ती होईल’ असा आशीर्वाद देऊन ते संचारार्थ निघून गेले.
विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर देवांतक आणि नरांतक पितृआज्ञेने अरण्यात गेले. तेथील एकांतात दृढ श्रद्धेने शिवमंत्राचा जप करू लागले. अशी बरीच वर्षे लोटली. त्यांची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी दोघांना दर्शन दिले. देवांतक व नरांतक म्हणाले, “हे देवाधिदेव, तुमच्या चरणी असलेली आमची भक्ती उत्तरोत्तर दृढ व्हावी, आम्हाला सुर, असुर, नर, यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर, सर्प किंवा पिशाचे यांच्याकडून दिवसा किंवा रात्री, शस्त्राने किंवा अस्त्राने मरण येऊ नये.” तेव्हा ‘तथास्तू’ असा आशीर्वाद देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले.
शिववरदानाने प्रबळ झालेल्या देवांतक आणि नरांतकांच्या मनात त्रिभुवनाच्या राज्याचा उपभोग घेण्याचे विचार थैमान घालू लागले. त्यांनी अमरावती ताब्यात घेऊन देवांतकाला इंद्रासनावर बसविले. इकडे नरांतकानेही पृथ्वी पादाक्रांत करण्याचा सपाटा चालविला. त्याने सज्जनांवर, ऋषीमुनीवर, ब्राह्मणांवर असंख्य अत्याचार केले. यज्ञकर्मे, देवपूजादी नित्यकर्मे बंद पाडली. सत्यलोक, विष्णूलोक, स्वर्गलोक, भूलोक व पाताळलोक आदी सर्व लोकांवर विजय संपादन करून ते दोन्ही बंधू एकमेकांच्या सहकार्याने निरंकुश सत्ता भोगू लागले.
*महोत्काटाचा जन्म*
कश्यप ऋषींनी गणपती कडून ‘मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा’ असे वरदान पूर्वीच मागून घेतले होते. आदिती ही त्यांची जेष्ठ पत्नी. कश्यप ऋषींनी आदितीला ओम गजाननाय नमः या मंत्राचे अनुष्ठान करण्यास सांगितले. पतीच्या आज्ञेने ती अरण्यात गेली. तेथे शंभर वर्ष एकोभावे आराधना केली. तिच्या विनंतीचा मान ठेवून गणपतीने सगुन साकार रूप धारण केले. त्याला पाहून आदीतीला परमानंद झाला. ती म्हणाली, “देवा तू माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावा, मला तुझे कोड कौतुक करता यावे अशी माझी फार इच्छा आहे.” तेव्हा “तथास्तु” असे अभिवचन देऊन गणपती अंतर्धान पावले.
यथावकाश आदिती गरोदर राहिली. प्रत्यक्ष परब्रह्मच आपल्या उदरी येत आहेत याचा तिला केवढा आनंद झाला. ती दिवसेंदिवस अधिकाधिक तेजस्वी दिसू लागली. एका सुमुहूर्तावर तिने अतिशय सुदृढ आणि सुंदर बालकास जन्म दिला. तेवढ्यात बालक रूपातील गणपती रडू लागले. त्याला तिने प्रेमाने हृदयाशी धरले. कश्यप ऋषींनी नूतन बालकाचे जातकादी कर्म केले. बाराव्या दिवशी त्याचे थाटामाटात बारसे केले. त्याचे *महोत्कट* नाव ठेवले.
*धुंधुरादी दैत्यांचा वध, चित्ररथ गंधर्वाचा उद्धार*
गजाननाने कश्यप ऋषींच्या घरी महोत्कट या नावाने अवतार घेतल्याचे वृत्त अंतर्ज्ञानाने ऋषींना तात्काळ समजले. देव आणि वशिष्ठ इ. थोर तपस्वी मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या दर्शनास आले. राक्षसांनाही महोत्कटाचे जन्मरहस्य कळले होते. हा वैरी पुढे त्रासदायक ठरेल म्हणून ते आधीपासूनच त्याच्या नाशासाठी उद्युक्त झाले. एके दिवशी कश्यप ऋषी नदीवर गेले होते. आदिती होमाची सिद्धता करीत होती. महोत्कट पाळण्यात निजला होता. त्याच्या आजूबाजूला कोणी नाही हे पाहून विरजा नावाची एक राक्षसी स्त्री रुपाने तेथे आली. तिने महोत्कटास गिळून टाकले, तर काय आश्चर्य! तिच्या पोटातून असह्य कळा येऊ लागल्या. तिला चालताही येईना. ती जमिनीवर गडबडा लोळू लागली. महोत्कटने महिमा सिद्धीने आपला देह विशाल करून तिचे पोट फाडले आणि तो सुखरूप बाहेर आला. मोठी किंकाळी मारून ती गतप्राण झाली.
विरजेची किंकाळी ऐकून आदिती पाळण्यापाशी धावली. त्यात महोत्कट नाही हे पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. ती तशीच अंगणाकडे धावली. तेथे एक महाकाय राक्षशीण रक्तबंबाळ होऊन मरून पडलेली दिसली. महोत्कट रक्ताने माखला होता. तिने त्याला गरम पाण्याने अंघोळ घातली. विरजा राक्षसीण दृष्ट हेतूने आलेली होती, पण गणपतीच्या हातून मरण आल्यामुळे तिला मुक्ती मिळाली. कश्यप ऋषि घरी आले. आदीतीने त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी आपल्या पुत्रावर शांती संस्कार केले आणि त्याच्या रक्षणासाठी गणपतीची प्रार्थना केली.
विरजेच्या निधनाचे वृत्त कळताच उद्धत आणि धुंधुर हे दोन दैत्य कश्यप ऋषींच्या आश्रमात आले. ते पोपटांच्या रूपाने बागडू लागले. महोत्कटाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. ते पाहून दोन्ही पोपट धिटाईने त्यांच्यापाशी गेले. लहानग्या महोत्कटाने झडप घालून दोघांनाही पकडले. तेव्हा त्याने रागाने दोघांनाही जमिनीवर आपटून ठार केले. मरताना ते मूळ स्वरूपात प्रकट झाले होते. आपल्या पुत्राचा तो पराक्रम पाहून कश्यप ऋषी आणि आदितीला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला.
या घटनेनंतर ची चार वर्ष सुरळीत गेले. एकदा सोमवती अमावस्यानिमित्त आदिती महोत्कटाला घेऊन एका सरोवरावर स्नानासाठी गेली होती. त्याला काठावर बसून ती पाण्यात प्रवेशली. तिचे लक्ष नाही आहे असे पाहून तोही पाण्यात उतरला. तेवढ्यात एका मगरीने त्याचा पाय धरला आणि त्याला आत मध्ये ओढत घेऊन जाऊ लागली. महोत्कटाने ओरडण्यास सुरुवात केली. तेव्हा महोत्कटाने प्रयत्नाची शर्थ करुन आपला पाय सोडून घेतला आणि त्या मगराला उंच भिरकावले. जमिनीवरच आढळताच तो महाकाय जलचर गतप्राण झाला. त्याच्या देहातून एक सुंदर गंधर्व प्रकट झाला. त्याने महोत्कटाला वंदन केले व म्हणाला, “देवा, आज तुमच्यामुळे माझा उद्धार झाला. मी चित्ररथ नामक गंधर्व आहे. भृगु ऋषींच्या स्वागतात काही उणिवा राहिल्या म्हणून ते संतापले. त्यांनी ‘तू मगर होशील’ असा मला शाप दिला. मी त्यांची क्षमा मागितली. मला उ:शाप द्या अशी विनंती केली. ते म्हणाले, “कालांतराने गजानन कश्यपपुत्र महोत्कट म्हणून अवतार घेईल. तो तुझा उद्धार करील.” हे त्यांचे वचन आज खरे झाले आहे. सर्वांना वंदन करून चित्ररथ आकाशमार्गाने गंधर्वलोकी निघून गेला.
श्री गणेश पुराण कथा (ब)*
*कश्यप आणि आदितीला ब्रम्हांड दर्शन*
महोत्कटाचे चरित्र मोठे विलक्षण आहे. एकदा हाहा, हूहू आणि तुंबरु हे तीन गंधर्व वीणेवर भगवन्नामस्मरण करीत कैलासाकडे निघाले होते. वाटेत कश्यप ऋषींचा आश्रम दिसला. कश्यप आणि आदितीने त्यांचे स्वागत केले. गंधर्वांनी स्नान केले. मग शिवपंचायतनाची पूजा करून ते ध्यानस्थ बसले. तेवढ्यात महोत्कट खेळत खेळत तेथे आला. त्याने पंचायतनात मांडलेल्या देवी, शंकर, विष्णू, गणपती आणि सूर्य यांच्या मूर्ती दूर भिरकावून दिल्या. त्यांनी कश्यप ऋषींकडे तक्रार केली. त्यांनी महोत्कटाला विचारले. तेव्हा तो भोकाड पसरून रडू लागला. त्यावेळी अदितीचे त्याच्या पसरलेल्या तोंडाकडे लक्ष गेले.
त्यामध्ये तिला स्वर्ग, मृत्यु, व पाताळासह चौदा भुवने आणि अनेक प्रकारच्या सृष्टीने भरलेले विराट ब्रम्हांड दिसले. ते पाहून तिला भोवळ आली. कश्यप ऋषींना ही त्या विश्वरूपाचे दर्शन झाले. त्यांनी त्याचे महात्म्य ओळखले. हा परमात्मा आहे याची त्यांना खूण पटली. कश्यप ऋषींनी महोत्कटाकडे हेतूपूर्वक पाहिले, तर काय आश्चर्य! पूजास्थानी पंचायतन देवता त्यांच्या सर्व वैभवासह विराजमान दिसल्या. कश्यप पुत्राचे ते लीला कर्तुत्व पाहून त्या तिन्ही गंधर्वांनी त्याला आदराने वंदन केले.
महोत्कट पाच वर्षाचा झाला. कश्यपांनी त्याचे चौलकर्म व मौजीबंधन करण्याचे ठरविले. होम हवनादी विधी संपन्न झाले. मुहूर्त समयी अंतरपाट धरण्यात आला. जमलेली मंडळी आशीर्वादाच्या स्वरूपात अक्षता टाकू लागली. त्याप्रसंगी विघात, पिंगाक्ष, विशाल, पिंगल आणि चपल हे पाच दैत्य वेशांतर करून तेथे आले होते. महोत्कटाचा घात करण्यासाठी अक्षतांच्या रूपाने त्यांनी अस्त्रेच टाकली. ते कपट महोत्कटाला तात्काळ समजले. त्यानेही अक्षरांवर पाच अस्त्रे अभिमंत्रित करून त्यांच्या दिशेने भिरकावल्या. त्या अस्त्राने त्या दृष्टांचा मंडपातच निकाल लावला. ते पाहून आनंदित झालेल्या देवतांनी व ऋषी जणांनी पुष्पवृष्टी करून महोत्कटाचा जयजयकार केला. राक्षसांची प्रेते दूर नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. मंडप स्थान स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर उर्वरित विधी सुरू झाले. कश्यप ऋषींनी महोत्कटाला गायत्री मंत्रोपदेश केला, आदितीने त्याला कौतुकाने भिक्षा घातली.
*धूम्राक्ष,जघन,मन्यु,दंतुर आदी दैत्यांचा वध*
कश्यप ऋषि पूर्वीपासूनच काशीराजाकडील धर्मकार्याचे पौरोहित्य करीत होते. एके दिवशी तो राजा ऋषींकडे आला व म्हणाला, “मुनिवर्य, माझ्या मुलाचा विवाह ठरला आहे. या मंगल कार्यात तुम्हीच पौरोहित्य करावे.” कश्यप ऋषी म्हणाले, “राजा, या चातुर्मासात मी यज्ञ करणार आहे. तसा संकल्प आधीच केलेला असल्यामुळे मी स्थान सोडून येऊ शकत नाही. या कार्यात तू माझ्या पुत्राचे सहाय्य घे.” राजाने त्याचे म्हणणे मान्य केले.
सात-आठ वर्षाच्या महोत्कटाला बरोबर घेऊन तो आपल्या सैन्यासह स्वस्थानी निघाला. वाटेमध्ये एक अरण्य होते. त्या अरण्यात धूम्राक्ष नावाचा एक दैत्य झाडाला उलटा टांगुन घेऊन दहा हजार वर्षांपासून तपश्चर्या करीत होता. नरांतकाचा तो चुलत बंधू धूम्रसेवन करून राहत असे. काशीचा राजा त्या अरण्यातून मार्गक्रमण करू लागला. योगायोगाने त्याच वेळी धुम्राक्षाची तपश्चर्या फळास आली. त्याच्यावर प्रसन्न होऊन सूर्याने एक दैदिप्यमान अस्त्र पाठवले. त्या अस्त्राकडे महोत्कटाचे लक्ष गेले. हे अस्त्र धुम्राक्षाच्या हाती लागले तर तो त्रिभुवनाला त्राही त्राही करेल याची त्याला कल्पना आली. त्याने उड्डाण करून ते अस्त्र पकडले आणि त्याच अस्त्राने धूम्राक्षाचा वध केला.
त्याची किंकाळी ऐकून त्या दैत्याचे जघन आणि मन्यु हे दोन पुत्र तेथे धावत आले. ते राजावर धावून गेले. ते ऐकून काशी राजाच्या सर्वांगाला भीतीने घाम फुटला. घशाला कोरड पडली. जघन आणि मन्यु महोत्कटाकडे क्रोधावेशाने बघू लागले. शस्त्र उगारून त्याच्या अंगावर धावले. त्यांच्या पवित्रा पाहून महोत्कटाने मोठी गर्जना केली. मग त्याने इतक्या जोराने श्वास सोडला की त्याच्या झोताने ते दोघे बंधू आकाशात उंच भिरकावले गेले. ते नरांतकाच्या नगरातील एका घरावर पडून जागीच ठार झाले. ते वर्तमान ऐकून नरांतक अतिशय संतापला.
इकडे महोत्कटाला बरोबर घेउन काशीराजा आपल्या नगरात प्रवेशला. लोकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. पुढे नगरातील मुलांनी महोत्कटासमवेत खेळण्यासाठी त्याला खूप आग्रह केला. त्याला त्यांचे मन मोडवेना. त्या बालकांमध्ये दंतुर आणि विंधर हे दोन दैत्य रूप पालटून आले होते. खेळता खेळता त्या दोघांनी महोत्कटास दोन्ही बाजूनी आवळून ठार करण्याचा जोरदार प्रयत्न केला. तेव्हा त्याने स्वतःला सोडवून त्या दुष्टांना इतके घट्ट आवळले की त्यांच्या हाडाचा चक्काचूर झाला. गतप्राण होऊन दोघे खाली कोसळले. त्यांची महाकाय कलेवरे पाहून लोकांच्या छातीत धडकीच भरली.
त्यावेळी पतंग आणि विद्युत हे दोन दैत्य वायू रुपाने महोत्कटाचा घात करण्यास आले. त्याने त्या दोन्ही राक्षसांना गाठले. त्यांचे गळे दाबून त्यांना एकेका मुष्टीनेच गारद केले. तेवढ्यात एक दैत्य मोठ्या दगडाच्या रूपाने रस्ता अडवून बसला. लोक संभ्रमात पडले. महोत्कटाने त्याला ओळखले. आपल्या हातातील अंकुशाने त्या दगडाच्या ठिकऱ्या उडवल्या. तो राक्षस छिन्नभिन्न होऊन विखरून पडला. राजधानीत प्रवेश केल्यापासून महोत्कटाने अशाप्रकारे अनेक दैत्यांना यमलोकी धाडले. हे सर्व लोकांच्या समोर घडले त्यामुळे तो गजाननाचा अवतार आहे अशी लोकांची खात्री झाली. त्यांनी जयजयकाराच्या गर्जनेत त्याला राजप्रासादात नेले. राजाने त्याची पूजा केली. त्याची उत्तम व्यवस्था ठेवली.
दुसऱ्या दिवशी धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण राजाला भेटण्यासाठी आला. राजाने महोत्कटाला बोलावून घेतले. तो म्हणाला, “बाळा, मी तुझ्या पित्याचा परममित्र आहे. तू माझ्या घरी आलास तर मला समाधान वाटेल.” त्याची विनम्रता आणि भक्तिभाव पाहून त्याला संतोष वाटला. काशीराजाची संमती घेऊन तो त्यांच्यासमवेत निघाला. मार्गामध्ये कामासूर आणि क्रोधासूर हे दोन दैत्य रूप पालटून एकमेकांशी भांडत होते. महोत्कटाला त्यांचा राग आला. त्याने दोघांचेही पाय धरले, त्यांना गरागरा फिरवले आणि दणकन खाली आपटले. मस्तकांचा चुराडा होऊन त्यांनी क्षणार्धातच श्वास सोडला. मरताना ते राक्षसी देहात प्रकट झाले होते. त्यांना ओलांडून महोत्कट पुढे निघाला.
समोरून एक मदोन्मत्त्त हत्ती प्रचंड चीत्कार करीत त्याच्या अंगावर धावून आला. महोत्कटाने उंच उडी घेऊन त्या हत्तीच्या गंडस्थळ गाठले आणि सर्व सामर्थ्यानिशी आपल्या हातातील अंकुश त्याच्या मस्तकात घुसवला. त्याच्या विशाल देह निष्प्राण होऊन खाली कोसळला. त्याचे एक बलाढ्य राक्षसात रूपांतर झाले होते. हे सर्व पाहून धर्मदत्त अगदी थक्क झाला. त्याने महोत्कटाला आपल्या घरी नेले.
जृंभा हि धूम्राक्ष दैत्याची पत्नी. ती धर्मदत्ताच्या घरोबातल्या एका स्त्रीचे रूप घेऊन तेथे उपस्थित होती. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर सुगंधी तेल घेऊन ती महोत्कटापाशी आली. ते तेल नसून विष होते. महोत्कटाने तिचे कपट ओळखले होते, पण तो काहीच बोलला नाही. मुकाट्याने तिच्या पुढ्यात बसला व तेल लावून घेऊ लागला. तेव्हा ते विष त्याच्या अंगात न भिनता तिच्याच अंगात भिनू लागले. तो दाह असह्य होऊन ती जमिनीवर गडबडा लोळू लागली. महोत्कटाने जवळच असलेला नारळ तिच्या डोक्यात आपटला. ती रक्तबंबाळ होऊन मरून पडली. ती राक्षसीण आहे हे कळताच धर्मदत्ताचे सर्वांग शहारले. तो भीतीने घामाघूम झाला.
आतापर्यंत घडलेला सर्व प्रकार पाहून आपल्या पुत्राचा विवाह विनाविघ्न संपन्न होईल की नाही याविषयी काशीराजाच्या मनात चिंता उत्पन्न झाली. त्याच रात्री आणखी एक संकट उद्भवले. नरांतकाचे व्याघ्रमुख, ज्वालामुख आणि दारूण हे तीन दैत्य नगरात प्रवेशले. महोत्कटाला घेऊन राजा त्वरेने बाहेर पडला. नागरिकांचे हाल पाहून त्याला मनस्वी दुःख झाले. तोच व्याघ्रमुख समोरून आला. त्याने महोत्कटाला गिळून टाकले. तेव्हा महोत्कटाने विशाल रूप घेऊन त्याचे पोट फाडले. मग त्याने अग्नी आणि वायूचे रूपाने उत्पात घडविणाऱ्या अन्य दोन्ही दैत्यानाही गिळून टाकले. हे महान सामर्थ्य पाहून लोकांनी त्याचा जयजयकार केला.
*ॐ नमो जी श्रीगणेशा । आद्य वन्द्य तु सुरवरेश्वरा । ॐकार_शुण्डा, शूर्प_कर्णा । ब्रह्माण्ड_उदरा, लम्बोदरा... (१)*
*उत्पत्ति, स्थिति, लय कधी ? कसा ?। का ? कुणाचा ? या गणितांच्या । 'समीकरण'रूपी तव 'पाशा'। हस्ती धरुनी क्रीडसी मोदे... (२)*
*तव सु'स्वरूप', लीलादिका । वर्णावे ऐशी मम इच्छा । पूर्ण करावी हीच प्रार्थना । तव चरणी मी करीतसे ...(३)*
*तव लीला_'अवतार' कथा । व्रते, पूजा विधि विधाना । गणेश, मुद्गल पुराणी वर्णिल्या । व्यासावतारी नारायणाने... (४)*
*त्यातील काही वेचक माहिती । 'मराठी' भाषेत करण्यास 'उक्ति' । द्यावी मजला बौद्धिक शक्ति । ऐशी विनवणी तव चरणी ...(५)*
*'कृत'युगी अदिति-कश्यप पुत्र । अवतरलास तु 'महोत्कट' । मारावयास नरांतक देवांतक । लीला विनोदे मांडिली... (६)*
*'त्रेता' युगी तु गिरिजात्मज । नामे 'गुणेश', 'मयूरेश्वर' । मारिलास 'सिंधु' दैत्येश्वर । भक्त संरक्षणाप्रीत्यर्थ ... (७)*
*'द्वापर' युगी ब्रह्मदेवे । देता जांभई 'सिन्दूर' उद्भवे । वरेण्य पुत्र 'गजानन' रूपे । चिरडून 'सिन्दूर'_वर्ण तव झाला ...(८)*
*'कलि' युगी तु युगांत समयी । 'धर्म' पुन: प्रस्थापण्यासी। 'धुम्रकेतु' नामावतारी। प्रगट होशील भविष्यात ...(९)*
*अवस्थेतली चतुर्थावस्था । जिला नाम 'तुरीया' वा 'तुर्या' । तीच स्वानंदे 'सहज' साध्य होता । तव सालोक्य मुक्तिचा लाभ... (१०)*
*चारही पुरुषार्थाञ्चा दाता । चारही सं_कष्टांचा हर्ता । विघ्न कर्ता धर्ता हर्ता । अनाकलनीय या तुझ्या लीला ...(११)*
*तुझे चतुर्थी तिथी_व्रत । शुक्ल, कृष्ण दोनही पक्षांत । 'विनायकी', 'संकष्टी' नामे प्रसिद्ध । प्रिय सर्व गाणेश भक्तासी... (१२)*
*शुक्ल पक्षात चंद्रोदय । दिवसा सूर्योदयानंतर । मेळविण्यास चारही पुरुषार्थ । ज्ञान_सूर्य उजेडात मानसीच्या ...(१३)*
*कृष्ण पक्षात चंद्रोदय । रात्री सूर्यास्ता नंतर । रात्री अंधार अज्ञान तिमिर । त्यावरी सं_कष्टांचा मारा ...(१४)*
*जेथे मानवी शक्ती, युक्ती । अपुरी पडे ऐशिया समयी । गणेशा तुझी कृपा दैवी । मागावया संकष्टी व्रताचरण... (१५)*
*गणेशा तुझी आद्य वंदना । मान्य सर्व वैदिक जना । शैव, शाक्त, सौर, वैष्णवा । 'गाणेश' तर तुझेच अनुयायी... (१६)*
*अवैदिक बौद्ध, जैन, शीख । वीरशैवादिक पंथ अनंत । तेही तुला मानिती अत्यंत । सर्वमान्य तु जगद्वंद्या... (१७)*
*वार_व्रत तव मंगळवारी । भौम, भूमिपुत्र ग्रहाचे वारी । येता 'चतुर्थी' त्याच वारी । 'अंगारकी' योग तव वरदाने... (१८)*
*ऐशी 'अंगारकी' विनायकी । तैशीच 'अंगारकी' "संकष्ट_चतुर्थी" । जे जे भक्तीने आचरिती । 'पुण्यार्जन' त्यांस अधिक होई ...(१८)*
*व्रताचरणार्थ 'उपवास'। पूजा, अर्चना करुनी 'विशेष' । गाती जे तुझी स्तोत्रे सतत । त्यांवरी 'प्रसन्न' होसी तु... (१९)*
*अदिती, पार्वती, लक्ष्मी देवीन्नी । ऐसेच तुजसी सुप्रसन्न करुनी । 'वरदानार्थ' तव मातृत्व मागुनी । अवतार तुजसी घडविले... (२०)*
*अदितीपुत्र 'महोत्कट'। पार्वतीपुत्र 'गिरिजात्मज' । लक्ष्मीपुत्र 'ढुंढिराज'। अवतार तुझे ऐसे नाना ...(२१)*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸रूप श्रीगणेशाचे.🔸*
*गणपती हे अति प्राचीन दैवत आहे, वैदिक देव आहे, आदिदेव आहे. कोणत्याही शुभकार्यारंभी अग्रपूजेचा प्रथम मान गणपतीलाच मिळाला आहे. श्रीगणेश हा सुख देणारा, दु:ख हरण करणारा, दुष्टांना शासन करणारा आणि भक्तांना आनंद देणारा, कोट्यवधी लोकांचं श्रद्धास्थान असलेला देव आहे.*
*दरवर्षी कोट्यवधी लोक अष्टविनायकांचं, साडेतीन पिठांचं आणि पुराणोक्त गणेशाचं मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. त्या गणरायांच्या २१ नाव, रूप, त्याला आवडणारी फुलं, फळं, नैवेद्य आदींविषयी...*
*१. मयुरेश्वर-मोरगाव, पुणे.
*२. सिद्धिविनायक-सिद्धटेक, अहमदनगर.*
*३. बल्लाळेश्वर-पाली, रायगड.*
*४. वरद विनायक-महाड, रायगड.*
*५. चिंतामणी-थेऊर, पुणे.*
*६. गिरिजात्मक-लेण्यादी, पुणे.*
*७. विघ्नेश्वर-ओझर, पुणे.*
*८. श्री महागणपती-रांजणगाव, पुणे*
*९. मंगलमूर्ती, चिंचवड, पुणे.*
*१०. कसबा गणपती-पुणे.*
*११. सिद्धिविनायक- सारसबाग, पुणे.*
*१२. गणेश- कढाव, रायगड.*
*१३. टिटवाळा-महागणती- ठाणे.*
*१४. पुळ्याचा गणपती- रत्नागिरी.*
*१५. हेदवीचा दशभुज-रत्नागिरी.*
*१६. वक्रतुंड- आवास, रायगड.*
*१७. मोदकेश्वर- नाशिक.*
*१८. मुद्गल गणेश-परभणी.*
*१९. चिंतामणी-कळंब, यवतमाळ,*
*२०. श्रीसिद्धिविनायक- प्रभादेवी.*
*२१. श्री सिद्धिविनायक-सीताबडीर्, नागपूर.*
*देशातील प्रसिद्ध २१ गणपती...*
*ॐकार गणेश-प्रयाग.* *महोत्कट- काश्मीर.*
*विघ्नराज- आंध्र प्रदेश.*
*श्वेता गणेश- केरळ.*
*गणेशजी- बंगाल.*
*मंगलमूर्ती -मध्य प्रदेश.*
*ढुंढीराज- काशी.*
*बदरी गणेश-हिमाचल.*
*गणेश बर्फ लिंग-हिमाचल.*
*नरक विमोचन गणेश- आसाम,*
*ब्रह्मागणेश- बिहार.*
*सीतामढीचा गणेश- बिहार.*
*षड्भूज गणेश- पंजाब.*
*बली गणपती- राजस्थान.*
*दुर्गकूट गणेश- गुजराथ.*
*पंचमुखी गणेश- मध्य प्रदेश.*
*खांडोळ्याचा गणेश- गोवरा.* *गोकर्णाचा गणेश- कर्नाटक.* *भद्राचलम गणेश- आंध्र.*
*कावेरीकांत विनायक- चेन्नई.*
*कल्पगणपती- ओरिसा.*
*जगातील प्रसिद्ध २१ गणपती.*
*पंचगणपती, नृत्यगणपती, सोळा हातांचा गणपती आणि हेरंब गणेश-नेपाळ.*
*गणेश-कंबोडिया.*
*द्वारपाल गणेश- तिबेट.*
*महापियेन गणेश-ब्रह्मादेश.*
*गुढविद्या गणेश-चीन.* *गणेशमूतीर्ती -मेक्सिको.* *गणेश-तुर्कस्तान.*
*गणेश- श्रीलंका.*
*गणपती-बानिर्ओ.* *गणेश-अफगाणिस्तान.* *गणपती- बाली बेट.*
*बोरीचा गणपती -इण्डोनेशिया.* *गणेश-जावा.*
*लेखक गणेश- सयाम.*
*गुरू गणेश- कंबोडिया.*
*गणपती- रोम, इटली.*
*श्री गणेश- जपान.*
*योद्धा गणेश- इराण.*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸गणपतीला आवडणाऱ्या २१ वस्तू.🔸*
*१) मोदक, २) नारळ, ३) चंदकोर, ४) ओम् ५) खेटव, ६) स्वस्तिक, ७) एकदंत, ८) विडासुपारी, ९) दूर्वा, १०) नागबंद, ११) मुद्गर, १२) शूल, १३) खट्वाग, १४) परशु, १५) पाश, १६) मोर, १७) अनंत फूल, १८) अंकुश, १९) कमळ, २०) उंदीर, २१) केवडा.....*
*गणपतीची २१ नावं...*
*१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष. ४ गजवक्र, ५. लंबोदर, ६. विकट, ७. विघ्नराजेंद, ८. धुम्रवर्ण, ९. भालचंद, १०. विनायक, ११. गणपती, १२. गजानन, १३. ओंकार, १४. मयुरेश्वर, १५. धुम्रकेत, १६. महोदर, १७. विघ्नराज, १८. ब्रह्माणस्पती, १९, जगदीश, २०. श्रीगणेश, २१. अदिदेव.....*
*पूजेसाठी २१ पानं...*
*दुर्वा, मधुमालती, बोर, माका, बेल, धोतरा, आघाडा, तुळस, डोलरी, कण्हेरी, शमी, अर्जुन, रुई, विष्णुकांत, जाई, डाळींब, देवदार, केवडा, मारवा, पिंपळ, अगस्ती.....*
*२१ फुलं...*
*जास्वंदी, पांढरं कमळ, तांबडं कमळ, जाई, मधुमालती, सोनचाफा, केवडा, बकुळ, उंडी, सुपारी, नागकेशर, मोगरा, धोतरा, कण्हेरी, प्राजक्त, चवई, नांदुरकी, गोविंद, मोहोर, शतपत्र.....*
*२१ पुराणं...*
*गणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रह्मावैवर्त पुराण, अग्नि पुराण, पद्म पुराण, पद्म पुराण उत्तर, नारद पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, लिंंग पुराण उत्तरार्ध, वराह पुराण, वराह पुराण उत्तरार्ध, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्माांड पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण ब्रह्माखंड, स्कंद पुराण अवंतीखंड, स्कंद पुराण प्रभासखंड.....*
*ठार मारलेले २१ राक्षस...*
*नारांतक, देवांतक, मधु, कैटभ, त्रिपुरासूर, सिंदुरासूर, व्यामोसूर, लोभासूर, मोहासूर, मदासूर, कमलासूर, विघ्नासूर, मत्सरासूर, देभासूर, अनसासूर, क्रोधासूर, मायासूर, कामासूर, मेषासूर, मलकासूर.....*
*गणपतीच्या २१ मूर्ती...*
*१. बाल गणपती, २. तरुण गणपती, ३. भक्ति विघ्नेश्वर, ४ वीरू-विघ्नेश, ५. शक्ति गणेश. ६. लक्ष्मी-गणपती, ७. उच्छिष्ट गणपती, ८. महागणपती, ९. उर्ध्व गणपती, १०. पिंगळा गणपती, ११. हेरंब गणपती, १२. प्रसन्न गणपती, १३. ध्वज गणपती, १४. उन्मत-उच्छिष्ट गणपती, १५. विघ्नराज, १६. भुवनेश गणपती, १७. नृत्य गणपती, १८. हरिदा गणपती, १९ भालचंद, २०. शर्पकर्ण, २१ एकदंत.....*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸अन्नपूर्णा स्तोत्र.🔸*
*ज्या घरावर अन्नपूर्णेची कृपा असते त्या घरातल्या माणसांना खाण्यापिण्याची ददात नसते, अर्थातच यात समृध्दीही आलीच आणि त्यामुळे ते घर सुखी असते. अशा अन्नपूर्णा मातेची परोपरीने स्तुति करून तिच्याकडे तिच्या कृपेची भिक्षा श्रीमद् शंकराचार्यांनी किती लीन भावनेने मागितली आहे हे वाचण्यासारखे (आणि ऐकण्यासारखेसुध्दा) आहे.*
*।।अन्नपूर्णा स्तोत्र।।*
*नित्यानन्दकरी वराभयकरी सौंदर्यरत्नाकरी।*
*निर्धूताखिल-घोरपावनकरी प्रत्यक्षमाहेश्वरी।*
*प्रालेयाचल-वंशपावनकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपुर्णेश्वरी।।१।।*
*नानारत्न-विचित्र-भूषणकरी हेमाम्बराडम्बरी।*
*मुक्ताहार-विलम्बमान विलसद्वक्षोज-कुम्भान्तरी।*
*काश्मीराऽगुरुवासिता रुचिकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।२।।*
*योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्माऽर्थनिष्ठाकरी।*
*चन्द्रार्कानल-भासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी।*
*सर्वैश्वर्य-समस्त वांछितकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।३।।*
*कैलासाचल-कन्दरालयकरी गौरी उमा शंकरी।*
*कौमारी निगमार्थगोचरकरी ओंकारबीजाक्षरी।*
*मोक्षद्वार-कपाट-पाटनकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।४।।*
*दृश्याऽदृश्य-प्रभूतवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी।*
*लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपांकुरी।*
*श्री विश्वेशमन प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।५।।*
*उर्वी सर्वजनेश्वरी भगवती माताऽन्नपूर्णेश्वरी।*
*वेणीनील-समान-कुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी।*
*सर्वानन्दकरी दृशां शुभकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।६।।*
*आदिक्षान्त-समस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी।*
*काश्मीरा त्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्यांकुरा शर्वरी।*
*कामाकांक्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।७।।*
*देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुंदरी।*
*वामस्वादु पयोधर-प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी।*
*भक्ताऽभीष्टकरी दशाशुभकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।८।।*
*चर्न्द्रार्कानल कोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी।*
*चन्द्रार्काग्नि समान-कुन्तलहरी चन्द्रार्कवर्णेश्वरी।*
*माला पुस्तक-पाश-सांगकुशधरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।९।।*
*क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी।*
*साक्षान्मोक्षरी सदा शिवंकरी विश्वेश्वरी श्रीधरी।*
*दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी।*
*भिक्षां देहि कृपावलंबनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।१०।।*
*अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे !*
*ज्ञान वैराग्य-सिद्ध्यर्थं भिक्षां देहिं च पार्वति।।*
*माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः।*
*बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् II*
*आदि शङ्कराचार्यविरचितम् अन्नपूर्णा स्तोत्रम्।*
*स्रोत: आंतरजाल...*
*🔸अन्नपूर्णा देवी.🔸*
*अन्नपूर्णा , अन्नपूर्णेश्वरी, अन्नदा किंवा अन्नपूर्णा ( संस्कृत : अन्नपूर्णा, अन्नपूर्णा, शब्दशः अन्नाने भरलेली किंवा धारण केलेली ) ही पार्वतीची एक रूप आहे आणि तिला अन्न आणि आहाराची हिंदू देवी म्हणून ओळखले जाते... हिंदू धर्मात पूजा आणि अन्न अर्पण करण्याची खूप स्तुती केली जाते आणि म्हणूनच, अन्नपूर्णा देवी ही एक लोकप्रिय देवता मानली जाते. ती शिवाची परेद्रा , देवी पार्वतीची रूप आहे, आणि भरतचंद्र राय यांनी लिहिलेल्या बंगाली भाषेतील अन्नदा मंगल या कवितेत तिची स्तुती केली आहे. अन्नपूर्णा सहस्रनाम देवीला समर्पित आहे आणि तिच्या एक हजार नावांची स्तुती करते, तर अन्नपूर्णा शतनाम स्तोत्रम तिच्या १०८ नावांना समर्पित आहे.....*
अन्नपूर्णी देवीला समर्पित काही मंदिरे अस्तित्वात आहेत, त्यापैकी काही सर्वात प्रमुख म्हणजे होरानाडू येथे अगस्त्याने स्थापन केलेले अन्नपूर्णेश्वरी मंदिर आणि वाराणसीतील अन्नपूर्णा देवी मंदिर... अक्षय तृतीया ही अन्नपूर्णाची जन्मतिथी मानली जात असल्याने, सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो.....*
व्युत्पत्ती...*
*अन्नपूर्णा हा शब्द संस्कृतमधून आला आहे, ज्याचा अर्थ अन्न आणि पोषण देणारा असा होतो... अन्न (अन्न) म्हणजे "अन्न" किंवा "धान्य" आणि पूर्ण (पूर्ण) म्हणजे "पूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण".....*
हिमालयातील अन्नपूर्णा पर्वताचे नाव तिच्या नावावरून ठेवण्यात आले आहे असे मानले जाते... कारण देवी पर्वतांचा राजा हिमावत याच्या कन्यांपैकी एक असल्याचे मानले जाते. पाश्चात्य जग तिला "हिंदू स्वयंपाकाची देवता" असे नाव देते, कारण अन्नपदार्थांशी तिचा संबंध आहे.....*
अन्नपूर्णाची इतर नावे...*
*विशालक्षी (संस्कृत: विशालाक्षी) - ज्याचे डोळे मोठे आहेत...*
*विश्वशक्ति (संस्कृत: विश्वशक्ति) - जागतिक शक्ती...*
*विश्वमाता (संस्कृत: विश्वमाता) - जगाची आई...*
*सृष्टिहेतुकावरदानी (संस्कृत: सृष्टिहेतुकावरदानी) - ती जी जगासाठी वरदान देणारी आहे...*
*भुवनेश्वरी (संस्कृत: भुवनेश्वरी) - पृथ्वीची देवी...*
*रेणू - अणूची देवी...*
*अन्नदा (संस्कृत: अन्नदा) - अन्नदाता...*
*आख्यायिका...*
*एके दिवशी, देव शिव आणि त्यांची पत्नी पार्वती भौतिक जगाबद्दल वाद घालू लागले... शिव म्हणाले की, भौतिकवादी सर्व काही फक्त एक भ्रम आहे, ज्यामध्ये मानवांनी खाल्लेले अन्न देखील समाविष्ट आहे. यामुळे भौतिकवादी पैलूंवर नियंत्रण ठेवणारी पार्वती संतप्त झाली. शिव आणि जगाला तिचे महत्त्व दाखवण्यासाठी, ती गायब झाली आणि म्हणाली की तिला तिच्याशिवाय जग कसे टिकेल ते पहायचे आहे.....*
*पार्वतीच्या अदृश्यतेमुळे, जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला... शिवाच्या अनुयायांनी त्याला अन्नाची याचना केली; देवांनाही अन्नाची भीक मागण्यास भाग पाडले गेले, परंतु त्यांना अन्न मिळाले नाही. शेवटी, शिव आणि त्याच्या अनुयायांना समजले की, पृथ्वीवर फक्त एकच स्वयंपाकघर आहे, वाराणसी (काशी) शहरात, जिथे अजूनही अन्न उपलब्ध आहे.....*
*शिव काशीला अन्न मागण्यासाठी गेले... त्यांना आश्चर्य वाटले की, स्वयंपाकघर त्यांच्या पत्नी पार्वतीच्या मालकीचे होते, परंतु अन्नपूर्णाच्या रूपात. तिने स्वर्गीय जांभळे आणि तपकिरी वस्त्र परिधान केले होते, जे हलकेच अलंकारांनी सजवलेले होते. ती एका सिंहासनावर बसली होती, ती उपाशी देवांना आणि पृथ्वीवरील भुकेल्या रहिवाशांना अन्न देत होती आणि त्यांना अन्न वाटत होती. अन्नपूर्णाने शिवाला भिक्षा म्हणून अन्न अर्पण केले आणि त्यांना हे जाणवून दिले की, ब्राह्मण म्हणून, शिवाने कदाचित भूक वाढवली असेल; परंतु त्यांच्या अनुयायांनी तसे केले नाही.....*
*स्रोत: आंतरजाल...*
श्री गणेशोत्सव*
पुष्प १
ॐ गं गणपतये नमः
*पार्थिव गणेशाची स्थापना केव्हा पासून करतात ? गणपती बाप्पा विषयी काही माहिती ..*
याबाबत असे सांगितले जाते की ज्याला धर्म ग्रंथ आधार आहे की भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली गजानन प्रसन्न झाले व व्यासांनी गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडीत पणे चालू आहे.
आता आपण आपल्या गणपती बाप्पा विषयी काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया .
१] वडील = *भगवान शंकर*
२] आई = *देवी पार्वती*
३] मोठा भाऊ = *कार्तिकेय*
४] बहीण = *अशोकसुंदरी*
५] 2 पत्नी = *रिद्धी व सिद्धी*
६] 2 पुत्र = *शुभ व लाभ*
७] श्री गणेशाचे जन्मठिकाण = *दोडीताल,उत्तरकाशी/कैलास पर्वत*
८] श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला ? = *देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उटण्यापासून*
९] वाहन उंदीर/मूषकाचे नाव = *डिंक*
१०] शिव मानस पूजेत श्री गणेशाचे नाव = *प्रणव*
११] गणेशाची पूजा/भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव = *गाणपत्य*
१२] श्री गणेशाला प्रथमपूज्य का म्हणतात ? = *कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्याने*
१३] बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला ? = *भगवान शंकर*
१४] चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले ? = हत्तीचे शिर बसवून
१५] श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली ? = *लेखनिक*
१६] श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ = *मोदक,लाडू*
१७] आवडता रंग व फुल = *लाल,जास्वंदीचे*
१८] प्रिय पत्री = *दूर्वा,शमीपत्र*
१९] हातातील मुख्य अस्त्रे = *पाश,अंकुश*
२०] नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य १२ नावे = *सुमुख,एकदंत,कपिल,गजकर्णक,लंबोदर,विकट,विघ्ननाश,विनायक,धुम्रकेतू,गणाध्यक्ष,भालचंद्र व गजानन*
२१] श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली ? = *समर्थ रामदास स्वामी
आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही म्हणून हा सांगण्याचा प्रपंच .
आपणा सर्व भक्तांवर गणेशाची कृपाद्रीष्टी राहो सर्व भक्तांना आयु आरोग्य सुख समृद्धी व यश प्राप्ती हो हीच श्री चरणी प्रार्थना ....शुभम भवतु।
*श्री गणेशोत्सव*
पुष्प २
।।ओम वक्रतुंडाय नमः ।।
सर्वत्र श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता, असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. मात्र, घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली, याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो. जाणून घेऊया...
गणेशासंदर्भात अनेक पौराणिक कथा विविध ग्रंथातून संदर्भ मिळतात .
महाभारत लेखक गणपती
महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, महर्षी व्यासांनी महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणपतीकडून लिहून घेतले. घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली, असे सांगितले जाते. महाभारताची रचना करताना महर्षी व्यास आणि गणपती यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या. गणपतीला आपल्या लेखनाच्या गतीबाबत आत्मविश्वास होता. गणपती महर्षी व्यासांना म्हणाले की, तुम्ही महाभारत कथा हळूहळू सांगणार असाल, तर मला कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी. ही अट आपणास मान्य असेल, तर आणि तरच लेखनाची जबाबदारी मान्य करेन, अशी अट गणपतीने घातली.
महाभारत लेखनाचा श्रीगणेशा
व्यास महर्षी होते. गणपतीच्या अटीवर त्यांनी केवळ स्मित हास्य केले. महर्षी व्यास गणपतीला म्हणाले की, आपली अट मला मान्य आहे. मात्र, मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला, उमगला, तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे. अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे, अशी अट महर्षी व्यासांनी ठेवली. गणपती तयार झाले आणि त्यांनी महाभारत लेखनाचा श्रीगणेशा केला. महर्षी व्यास नेमके काय सांगताहेत हे समजून घ्यायला अनेकदा गणपतीला विलंब व्हायला लागला. संपूर्ण महाभारत कथा समजून लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते.
घरोघरी पार्थिव गणपती पूजन केव्हा पासून सुरू झाले
महाभारत कथा पूर्ण होण्यात मोठा कालावधी लोटला. कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. हा लेप लावून लावून जाडसर झाला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून महाभारताचा लेखक म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.
महाभारतकालीन गणपती अवतार
गणेशाने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात अवतार घेतल्याचे सांगितले जाते. गणेशाने सत्ययुगात कश्यप आणि अदितीकडे महोत्कट विनायकाच्या अवतार धारण केला. या युगात गणपतीने देवतान्तक आणि नरान्तक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केली आणि आपल्या अवतारकार्याची सांगता केली. गणेश त्रेता युगात मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले. तर, द्वापारयुगात गणेश उंदीरावर बसून प्रगट झाले. गणेशाला पौराणिक पत्रकार किंवा लेखक असेही संबोधले जाते. कारण याच युगातील अवतारात त्यांनी महाभारत लिहिले होते, असे सांगितले जाते.
पेशवे आणि घरगुती गणेशोत्सव
सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला. दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले. लोकमान्यांनी जनसामान्यांची एकत्रीकरण स्वातंत्र्या विषयी जन जागृती निर्माण करण्यासाठी गणेशोत्सवाचा फार प्रभावी उपयोग केला . आजचे हे पुष्प श्री गजाननाचे चरणी समर्पित .
हिंदुस्तान विश्वगुरु हो हीच गणरायाचे चरणी प्रार्थना ।
श्री गणेशोत्सव*
पुष्प ३
गणपती बाप्पाला तुळस का वाहत नाहीत ?
श्री गणपती म्हणजे चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती .. पण गणपतीचं आज घराघरांत आगमन मोठ्या जल्लोषात होतं . बाप्पाच्या पुजनात दुर्वांची जुडी आणि मोदकाचा नैवद्य अग्रस्थानी असतो. पण घराघरात पुजली जाणारी तुळस मात्र बाप्पाला वर्ज्य मानली जाते. वर्षातून फक्त एकच दिवस गणेश चतुर्थीला ती गणपतीला वाहिली जाते. सर्व देवदेवतांच्या पुजेत स्थान मिळवणाऱ्या तुळशीला गणेशपुजेत स्थान न देण्यामागं काही कथा सांगितल्या जातात. पौराणिक कथेनुसार, धर्मराजाची कन्या वृंदाने विष्णूसोबत विवाह करण्याचा हट्ट केला होता. तेव्हा देवाशी लग्नाऐवजी मानवी वर शोधू असं म्हटलं. त्यानंतर वृंदाने विष्णूची आराधना केली. ध्यानधारणा आणि तप केले. एकदा ती भगीरथी नदीच्या काठावरून जात असताना ध्यानाला बसलेल्या गणेशाला तिनं पाहिलं. त्याच्या तेजानं प्रभावित झालेल्या वृंदानं गणपतीला हाक मारण्यास सुरुवात केली. यामुळं त्याच्या तपस्येत अडथळा निर्माण झाला. याचं कारण गणपतीनं तिला विचारलं. त्यावर वृंदा म्हणाली, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. गणपती म्हणाला की, मी मोहपाषात अडकणार नाही. मी ब्रम्हचर्याच्या मार्गावर आहे. मी विवाह करणार नाही. गणेशाच्या या उत्तरानं आपला अपमान झाल्याचं समजून त्याला शाप दिला की, तुझा विवाह होईल. वृंदेन दिलेल्या शापावर गणपतीनंही शाप दिला की, तुझा विवाह एका राक्षसासोबत होईल. माझ्या पुजेत तुला स्थान नसेल. गणपतीच्या शापानंतर वृंदाला तिची चूक समजली. तिनं गणपतीची माफी मागितली. त्यानंतर वृंदानं गणपतीची उपासना केली. तेव्हा प्रसन्न होऊन गणपती म्हणाला की, तुला माझ्या पुजेत वर्षातून फक्त एकदात स्थान मिलेल. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुळस वाहता येईल. या दिवशी वाहिल्या जाणाऱ्या 21 प्रकारच्या पत्रींमध्ये तुलाही स्थान असेल मात्र इतर कोणत्याही दिवशी तुळस वाहता येणार नाही. पुढच्या जन्मात वृंदाचा जन्म एका राक्षसाच्या पोटी झाला. त्यानंतर महापराक्रमी अशा राक्षसासोबत विवाह झाला. त्याचा मृत्यू होताच तिनं चितेत उडी घेऊन प्राणत्याग केला आणि वृक्षरुपात तुळस झाली. त्यानंतर तुळशीला विष्णूपत्नी मानलं जाऊ लागलं. विष्णू पत्नी म्हणून तिची पुजा करतात मात्र तरीही गणपतीच्या पुजेत आजही तुळस वर्ज्य मानली जाते. फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपतीच्या पुजेत तुळशीला मान मिळतो. अशी ही तुळस औषधी पत्रित समाविष्ट होऊन श्री चरणी समर्पित झाली .
श्री विनायकाचे चरणी पुष्प ३ समर्पण इतकीच प्रार्थना या विश्वात शांतता व समृद्धी हो .सर्वत्र विश्वबंधुभाव हो . गणेशा चे कृपेने समृद्धी हो .
गणेश जन्माची कथा काय आहे ?
जगतपिते त्रिदेव भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर . निवासास असता एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतीला स्नानाला जायचे होते.
जगन्मातेने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला. तिने स्वतः मातीपासुन एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली.
आपल्या मंत्र शक्तीने तिने त्या मूर्तीत प्राण आणुन मुलाला जिवंत केले.
जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासुन नमस्कार केला. तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले, “तु माझा मुलगा आहेस. तुझे नाव गणेश.”
गणेश म्हणाला “आई, मला भुक लागली आहे. काहीतरी खायला दे ना.”गणेशला खाण्यासाठी तिने लाडु, मोदक असे अनेक चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले. गणेशला फार आनंद झाला. तो त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला लागला.
पार्वतीने त्याला सांगितले “गणेश, मी माझ्या कक्षात अंघोळीला जात आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. इथेच थांबुन लक्ष ठेव.”
गणेश म्हणाला “हो आई, मी लक्ष ठेवेन. कोणालाही आत सोडणार नाही.”
पार्वती आत गेली. काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले.
ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागताच गणेशाने त्यांना अडवले.
“थांबा, आत जाऊ नका. माझी आई आत गेली आहे, तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे. तुम्ही इथेच थांबा.”
शंकर म्हणाले, “अरे मुला, हा माझाच कक्ष आहे. मी पार्वतीचा नवरा. मला मनाई नसेल केली तिने. तु वाट सोड.”
गणेश म्हणाला, “तुम्ही म्हणालात तसे असेल, पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते. कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगितले होते. त्यामुळे मी तुम्हाला आत सोडु शकत नाही.”
शंकराचा सेवक नंदी मध्ये पडला. तो म्हणाला “अरे मुला, तुला माहीत नाही, हेच या कैलास पर्वताचे अधिपती भगवान शंकर आहेत. हे त्यांचेच निवासस्थान आहे. तू त्यांना अडवण्याची चुक करू नकोस.”
गणेश म्हणाला, “तुम्ही कोण?”
नंदी म्हणाला “मी महादेवाचं सेवक, नंदी.”
गणेश म्हणाला “तुम्ही कधी महादेवांनी केलेली आज्ञा मोडाल का?”
नंदी म्हणाला “असे कसे होईल? माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा विचारही करू शकत नाही मी.”
गणेश म्हणाला “मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे सांगता? मलाही तिची आज्ञा मोडायची नाही. तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा, मी कोणालाही आत जाऊ देणार नाही.”
वाद वाढत गेला पण गणेश काही ऐकत नव्हता. त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती. शेवटी भगवान शंकर क्रोधीत झाले.
भगवान महादेवाच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटते. त्यांनी क्रोधीत होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर येईल ते भस्म करतात, सर्व जगाचा विध्वंस करण्याची त्यांच्यात शक्ती आहे.
त्वरेने सारे देव, ब्रह्मा, विष्णु स्वतः हजर झाले. त्यांनीसुद्धा गणेशाची समजुत काढली. पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता.
महादेवाचं क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपले त्रिशुल गणेशावर फेकले, एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर उडुन दिसेनासे झाले.
शंकर त्याला ओलांडुन आत जायला निघाले तोच पार्वती बाहेर आली.
गणेशाचे मस्तकहीन शरीर पाहुन तिला धक्का बसला. तिने प्रचंड आक्रोश केला. तिला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधीत झाली.
तिने शंकराला आणि उपस्थित सर्वाना जाब विचारला. “गणेश माझा मुलगा होता. मी त्याला निर्माण केले होते. तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता. आणि त्याने हे तुम्हा सर्वाना सांगुनही तुम्ही त्याला मारलंत. एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात? काय चुक होती त्याची?”
शंकर आता नरमले होते. “देवी, आम्हाला क्षमा कर. आम्हाला गणेशबद्दल माहित नव्हते. तो माझी वाट अडवुन बसला होता त्यामुळे मी क्रोधीत झालो.”
“माहित असो वा नसो, तो एक लहान मुलगा होता. त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको?”
“तुझे बरोबर आहे देवी. आम्हाला आता फार पश्चाताप झाला आहे.”
“त्याचा काही फायदा नाही. तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल? मला माझा मुलगा हवा आहे.”
“ते आता कसे शक्य आहे देवी? आमच्या त्रिशुळाने गेलेला जीव परत कसा येईल?”
“ते मला माहित नाही स्वामी. मला माझा मुलगा हवा आहे एवढंच मला ठाऊक आहे. तुम्हीच बघा कसं आणायचं ते.”
शंकर विचारात पडले. शेवटी त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला, कि त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शीर आणावे.
त्यांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बाल हत्ती. त्यांनी त्याचे शीर आणले. महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शीर गणेशाच्या शरीरावर जोडुन गणेशला पुन्हा जिवंत केले. तोच आपला गणपती हत्तीचे शीर असलेला .
गणेशला सर्व देवांनी आशीर्वाद दिले. महादेवांनी देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला. त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात. प्रथम ईश्वर म्हणुन त्याचे एक नाव प्रथमेश आहे.
गजाचे आनन म्हणजे शीर असलेला देव म्हणून गजानन असेही नाव प्राप्त झाले आहे. हाच सर्व गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती हि नावे आहेत.
प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. गजाचे मस्तक असलेला गणपती बुद्धीचा देव आहे.
अशा या गणपतीची बाप्पाच्या जन्माची हि विलक्षण कथा आहे.
हा गणपती विद्येचा अधिपती , विघ्नांचा नाश करणारा विनायक सकल समृद्धी देणारा हा वरद विनायक होय ..आपण उत्सव काळात अत्यंत मनोभावे व श्रद्धेने गणेशाची उपासना करावी व जीवनात यशस्वी व्हावे हीच प्रार्थना . आपले कल्याण असो .शुभम भवतु ।
श्री गणेशोत्सव*
पुष्प ५
विषय ....गणपती पूजा यादी व रामदास स्वामींनी लिहीलेली आरती व त्याचा अर्थ
अ ) गणपती प्रतिष्ठापना सामानाची यापूजादी ..(.फक्त स्मरणासाठी)हळद, कुंकू, अक्षता, शेंदूर अष्टगंध, गुलाल, अत्तर, अत्तर वाहण्यासाठी थोडासा कापूस, उदबत्ती, धूप, कापूर, काडेपेटी, फुले, फुलांचा हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री (शमीचे पान, रुईचे पान, आघाडा, केवड्याचे पान इत्यादी), जानवे, पाण्याने भरलेला तांब्या, पळी आणि भांडे, ताम्हण, पंचामृत, तुपाची छोटी वाटी (निरांजनात तूप घालण्यासाठी), .समई , निरांजन कलश विड्याची पाने फळे नारळ प्रसादा साठी पेढे मिठाई पंचामृत , दूध अभिषेक पात्र,
ब ) गणपती आरती, शब्दश: अर्थ
*सुखकर्ता दु:खहर्ता = सुख देणारा दुःख हरण करणारा.....*
*अजूबाजूकडून सतत बातम्या येत असतात. त्या सुखाच्या व दुःखाच्या पण असतात. त्यातील विघ्नाच्या, दुःखाच्या राहू देऊ नको....,*
*नुरवी = न उरवी, फक्त प्रेम पुरव, दुःखाचा समुळ नाश करतो.....*
*पुरवी प्रेम कृपा जयाची = त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव भक्ताला लाभ होतो.....*
*सर्वांगी सुन्दर उटी शेंदुराची = गणेश सर्वांगाने सुंदर आहे. त्याने शेंदुराची उटी लावली आहे.....*
*कंठी झळके माळ मुक्ताफळांची = त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे.....*
*जय देव जय देव जय मंगलमूर्ति |* *दर्शनमात्रे मन कामना पुरती ||धृ||*
*म्हणजे = हे देवा, तुझा जयजयकार असो. तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस. तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.....*
*रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा = हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे. रत्नखचित फरा म्हणजे रत्नांचा तुरा. जसा मोराला, कोंबड्याला तुरा असतो तसा. तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे असे कृष्णलिला वर्णन आहे.....*
*चंदनाची उटी कुंकुमकेशरा = कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तु लावली आहे.....*
*हिरेजडित मुकुट शोभतो बरा = हिऱ्यानी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे.....*
*रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया = तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरां चा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे.....*
*लंबोदर पीतांबर फणिवर बंधना = मोठे पोट असणाऱ्या, पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.....*
*सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना = सरळ सोंड व वाकडे तोंड असणाऱ्या,म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन त्याना सरळ मार्गावर आणणाऱ्या, त्रिनयना (३ नेत्र असणाऱ्या).....*
*दास रामाचा वाट पाहे सदना = हे गणपते, मी रामाचा दास (समर्थ रामदासस्वामी) माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे.....*
*संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना = हे सुरवरवंदना = सर्वश्रेष्ठ देवां कडून वंदिल्या जाणाऱ्या हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर.....*
*निर्वाणी = अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना.....*
*आता थोडे निरुपणत्मक:*
*सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |*
*या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.....*
*नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ||*
*म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.....*
*सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ता फळाची ||*
*त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.....*
*जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती |* *दर्शनमात्रे मन कामना पुरती || १ ||*
*त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. ‘दर्शनमात्रे’ च्या जोडीला काही भक्त तर ‘स्मरणमात्रे’ च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच ‘ये दिल मांगे मोअर’ म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रू पक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार?*
*पण इथे मला थोडा वेगळा अर्थ लावावासा वाटतो. मनोकामना, या शब्दाचे विघटन करावे वाटते. मन पूर्ण करतो (म्हणजे या देहीचे त्या देही घातले, किंवा माझे मन तुझे झाले, एकरूपता, किंवा ध्यानात गण-ईश, असा अर्थ लावूयात) नि कामना ही. इथे तो ईश आहे...., गुणाधीश जो ईश सर्व गुणांचा आहे, म्हणून विघटनात्मक, विनाशात्मक, कामना तो कसा पूर्ण करणार. विद्या-अधिपती म्हणतो, मग तो फक्त सकारत्मक वृत्तीचे जोपासन करेन, सत्याची बाजू घेईन, मित्र-शत्रू हे शब्द आपल्यासाठी, तो तर फक्त भक्तालाच जाणतो.....*
*या आरतीच्या दुसऱ्या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्र-संगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पितृदेव भगवान शंकर अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.....*
*रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा । *चंदनाची उटी कुंकुम केशरा ||*
*हिरे जडीत मुकुट शोभतो बरा |* *रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ||*
*पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणाऱ्या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घागऱ्यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.....*
*शेंदुरावरून आठवले, हनुमानाला शेंदूर एवढा का प्रिय आहे याचं उत्तर ‘रामचरित मानस’ मध्ये मिळतं. एकदा हनुमानाने सीतेला आपल्या भांगात शेंदूर भरताना पाहिलं. या गोष्टीचं हनुमानाला खूप आश्चर्य वाटलं. असं शेंदूर लावण्याचं कारण हनुमानाने सीतामाईला विचारलं. त्यावर सीता माई उत्तरल्या, “माझे पती श्रीराम यांच्या दीर्घायुष्यासाठी मी हा शेंदूर भांगात भरते..... धर्मशास्त्रानुसार असा शेंदूर लावल्याने आपल्या स्वामींचं आयुष्य वाढतं. त्यांना कुठलेही विकार होत नाहीत......”*
*सीतेचं हे उत्तर ऐकून हनुमंताने विचार केला, जर चिमुटभर शेंदूराने प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढणार असेल, तर जर मी सबंध शरीरावर शेंदूर फासला तर प्रभू रामचंद्र अमर होतील. हाच विचार करून बजरंगबली हनुमानाने आपल्या संपूर्ण शरीरावर शेंदूर चढवण्यास सुरूवात केली आणि त्यामुळेच हनुमानाला शेंदूर चढवण्याची पद्धत निर्माण झाली. हनुमानास शेंदूर चढवणं हे श्रीरामांचंच पूजन असतं. त्यामुळे असा शेंदूर चढवण्याने हनुमान प्रसन्न होऊन आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात.....*
*पूजनाच्या सोपस्काराचा शास्त्रार्थ तर आहेच पण वैज्ञानिक करणे देखील आहेत, शिवाय संत वचन, भक्तांची श्रद्धा, मूर्तीला स्पर्श करतानाची भावना, त्याला बाळ समजून किंवा सर्वाधीश समजून, समजून उमजून केलेली पूजा याची मजा काही औरच, ती फक्त अनुभवायची असते, शब्दामध्ये उतरवणे कठीण असते. आपल्या भावना त्याच्यापर्यंत पोचतात. याचे अनुभव देखील आपल्या सर्वांना आहेतच.....*
*भारतीय शिल्पकलेत प्रथमपासूनच गणेश गजानन, एकदंत व लंबोदर रूपात आहे. गणेशाच्या ध्यान, प्रार्थना व मंत्रही असेच रूपवर्णन करतात:*
*सर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं, लम्बोदरं सुन्दरं*
*प्रस्यन्दन्मद्गन्ध लुब्धमधुपब्यालोल गण्डस्थलम् |*
*दन्ताघात विदारितारिरुधिरैःसिन्दूरशोभाकरं*
*वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम् || (गणेशध्यानम्)*
*नामदेवांनी पण गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. ते म्हणतात,*
*लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड | करीतसे खंड दुश्चिन्हांचा ||*
*चतुर्थ आयुधे शोभतासी हाती | भक्ताला रक्षिती निरंतर ||*
*तिसऱ्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला दिसत नाही. त्रिनयना हे सूक्ष्मातले ध्यान आहे. तिसरे नेत्र हे दिव्य अशा ज्ञानचक्षूचे द्योतक आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातल्या मूर्तीला मध्यभागी तिसरा डोळा दाखवला आहे.....*
*लंबोदर पितांबर फणिवर वंधना |* *सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||*
*दास रामाचा वाट पाहे सदना |*
*संकटी पावावे सुरवर वंदना ||*
*अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुष्टी त्याला जोडून केली आहे). काही लोक शेवटची ओळ ”संकष्टी पावावे” असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात.....*
*सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला असेल असे मला तरी कधी जाणवले नाही. सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे.....*
*तीनशे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.....*
श्री वरद विनायकाची आपण व आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी हीच श्री चरणी प्रार्थना हे संग्रहित विशेष पुष्प माहिती व शास्त्रीय माहिती आपणा पर्यंत पोहोचविण्यासाठी . शुभम भवतु ।
घरातील देवपूजा करताना या 20 नियमांचे पालन करायलाच हवे.
ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते, नित्य देवतांची स्तुती आणि निर्मळ मनाने सेवा केली जाते तेथे सुख, समृद्धी आणि सकारात्मक व पवित्र वातावरण नेहमीच असते. दुःख, दारिद्र्य दूर होते. नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्यास हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो.
घरातील वातावरण शुद्ध राहते. हिंदु पुराणानुसार देवपुजेचे काही महत्वाचे नियम ठरवलेले आहेत. या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते. भगवंताची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते. महालक्ष्मी सह सर्व देवी-देवता आपल्यावर प्रसन्न राहतात.
1) तुळशीची पाने 11 दिवसा पर्यंत शिळी होत नसतात. त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करता येतात.
2) दिवा नेहमी परमेश्वराच्या मुर्तीसमोर ठेवला पाहिजे. तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी.
3) पूजेकरिता कधीही तुटलेला भग्न दिवा वापरू नये. तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही.
4) शिवजींना बेलाची पाने आवडतात त्यांना ती अर्पण करावी.
5) कोणत्याही पुजेच्या वेळी आपल्या स्वेच्छेने देवाला दक्षिणा हिनक्की द्यावी. दक्षिणा देताना स्वतःचे दोष दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे. निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते. ईश्वर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल.
6) प्रत्येक पुजेमध्ये तांदळाला अतिशय महत्त्वाचे स्थान असते. पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे. तुकडे झालेले तांदूळ वापरू नये. हळदीचे पाणी करुन त्यात तांदूळ पिवळे करुन मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते. नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे.
7) विड्याची पाने देखिल पूजेसाठी अवश्य ठेवावी. वेलची, लवंग, गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर अतिउत्तम.
पूजेच्या मध्यभागी दिवा मधेच विझू नये याकडे विशेष लक्ष द्यावे. जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.
8.) कोणत्याही देवाला पूजा, ध्यान, आसन, स्नान, धूप-दीप, अक्षता (तांदूळ), कुमकुम, चंदन, फुले (फुले), प्रसाद इत्यादींना आमंत्रित (आमंत्रित) करणे आवश्यक आहे.
9) भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये.
10) पूजेच्या ठिकाणी स्वचछता आणि पवित्रता यांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये. चामड्याची कोणतीच वस्तू पुजा अर्चा करताना जवळ बाळगू नये. पूजाघर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. म्हणतात ना “हात फिरे तिथे लक्ष्मी वसे”
11) भगवान श्री विष्णूस प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे. देवी दुर्गा, सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे.
12) कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता, इष्टदेवता, वास्तु देवता, ग्रामदेवता यांचे स्मरण करुन त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम घ्यायला हवे. पूजेसाठी सर्व देवतांचे आवाहन करायला हवे. पुजेच्या आधी देवांना स्नान घालावे, धूप दीप प्रज्वलित करावे, हळदी कुंकू लावावे तसेच पुष्प, बेलपत्र, चंदन, अक्षदा असणे गरजेचे असते.
13) आपण पुजेकरिता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकवू नये ते नेहमी हाताने सरकवावे.
14) आपण दररोज तूपाचे निरांजन लावावे त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात.
15) देवघराच्या वर अडगळीच्या वस्तू ठेवू नये तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेऊ नये.
देव्हाऱ्यावर काहीही ठेऊ नये . देवाला भार होतो .
16) देवतांना पुष्पहार, ताजीतवानी फुले, पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.
17) भगवान सूर्याला सात प्रदक्षिणा घालाव्यात, श्री विष्णूला चार, श्री गणेश यांना तीन आणि शिवजींना आर्धी प्रदक्षिणा घालावी.
18) घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंच लोकपाल, षोडश माता, साती आसरा यांचीही उपासना अनिवार्यपणे केली पाहिजे.
19) या सर्वाबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात पंडित कडून मिळू शकते. विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे, जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल.
20) भगवान सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गामाता, शिवजी आणि श्रीविष्णू ह्या पंचदेवतांची पूजा अवश्य करावी. दररोज पूजा करताना
रोज घरात देवपूजा करून सकारात्मक वातावरण होते त्यामुळे पुण्यसंचय तर होतोच पण घरात अनुकूल व मंगल गोष्टी घडतात . दत्तनामात राहा कल्याण होईल शुभम भवतु .
: श्री गुरु लीलामृत
अध्याय ४९
भाग ०३
जप, तप, व्रत, नियम, अनुष्ठाने शाखाने प्रतिपादिली आहेत, ज्यांद्वारे स्वर्गप्राप्ती होवू शकते. यज्ञ करण्यास भरपूर खर्च येतो, त्याद्वारे स्वर्गाचे द्वार खुले होते. असे समजणारे समजतातही. पण म्हणून धन मोक्षास संपूर्ण कारण ठरत नाही. धन नाही म्हणून यज्ञ करता येत नाही व आपण मोक्षास मुकलो, असे समजण्याचे कारण नाही.
स्पष्टच सांगावे तर सर्वसंग परित्याग करण्यानेच मोक्षरूप प्राप्त होते हे जाणावे, ते सर्व या श्रीगुरुलीलामृत ग्रंथात यथामति वर्णन केले आहे.
आता 'आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति' अशी बृहदारण्य श्रुती आहे, तिचे निरूपण संक्षेपात करतो, ते परिसावे. आपल्या सुखाचे साधन आपण काय समजतो? पती, पत्नी, पुत्र, सोने, धन, संबंधित पशु, पक्षी हे आपल्या सुखासंबंधाने आपल्याला प्रिय असतात. ब्राह्मण क्षत्रियादि जाती, जमीन, बेद, श्रुती, स्थावर जंगम, सकल प्राणीमात्र असे जगतातील समस्त जीयांच्या प्रीतीचे जेवढे म्हणून पदार्थ आहेत, ते आपल्या सुखासाठी आपल्याला प्रिय वाटतात. दुसऱ्याच्या प्रिय भावना इवे गृहीत नसतात. दुसऱ्याच्या प्रिय पदार्थासाठी कोणी शक्यतो धडपडत नसतो. स्वतःच्या प्रिय पदार्थासाठी प्रत्येकाची घडारड असते. आपल्याला जो अनुकूल आहे त्यावरच जीवाची प्रीती राहते, आपल्याला प्रतिकूल असलेल्या जीवावर कुणाचे प्रेम नसते.
जो पुत्र स्वतःला अनुकूल त्यावर पित्याचा भारी जीब, पुत्रादिकाच्या प्रीतिस्तव नव्हे. स्वतःस उपयुक्त असेल ते प्रियः ज्याची उपयुक्तता नाही त्या अपत्याला पिताही प्रतिकूल असतो. माणूस दुसऱ्यासाठी नव्हे, स्वतःच्या अनुकुलतेने जगतो हे तात्पर्य, सुख देणारा म्हणून पती पत्नीला प्रिय. पतीला सुख देते म्हणून ती पत्नी पतीला प्रिय. आपल्या अनुकूल काळात प्रिय असणारा, विरोधात गेला की तो अस्तनीतला निखारा ठरतो.
म्हणजे, प्रत्येक जीवाला आपला आत्मा प्रिय असतो, हेच खरे. आसपासची माणसे काही कारणांनी प्रिय असतात. ती कारणे संपली की आपलेपणा परकेपणात बदलतो. प्रत्येकजण स्वतःच्या स्वभावानुसार, आपल्या गरजेनुसार, उपयुक्तता पाहून आपली प्रिय वस्तू ठरवित असतो. हे संबंध आत्मसंबंध म्हणून प्रियरूप नसतात. स्वभाव दृष्टीने प्रियरूप असतात. माणसाच्या स्वतःच्या संकल्पनेवर समोरचा प्रिय अप्रिय ठरविला जातो. ज्या काळात जीवाला पत्नीची इच्छा झाली व त्या त्या वेळी ती प्राप्त झाली, म्हणजे ती प्रिय ठरते. वियोग झाला की त्या व्यक्तिसंबंधाने मनुष्यजीव दुःख झाल्याचे सांगतो. म्हणजे हे सगळे तत्कालिक प्रिय पदार्थ अनात्म ठरतात. तसे आनंदस्वरूप आत्म्याचे नाही. तो परमशुद्ध आहे. तो जीवांचा प्रियतम आहे. प्रिय शब्दाहून अधिक उत्तम अवस्था प्रियतर ही, तर त्याहूनही प्रिय ते 'प्रियतम.'
प्रियतम कोण? तर जो कायम आहे तो! असा कोण आहे ? आत्मा हा प्रियतम आहे. त्याच्या सारखा दुसरा कुणी नाही. आत्मानंद लेश मात्र झाला तरी तो अनुभवणारा सर्वोच्च आनंद अनुभवतो. सर्व आनंदापेक्षा आत्मानंदाची स्थिती अत्याधिक म्हणून आत्मानंद हा उत्कृष्ट, असे वेद म्हणतात. हा आत्मानंद जे अखंडपणे अनुभवतात ती स्थिती वा ते लोक म्हणजे महात्मादिक उच्च जीव.
स्वर्गलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे आनंद आहेत ते विषयजन्य आहे. त्या आनंदापेक्षा अधिक महान व ज्यात वेगळेपणा उरला नाही असा तो ब्रह्मानंद, ब्रह्मानंद आपल्या जीवात्म्यापासून भिन्न नाही. कारण तोच सर्व जीवांचा आत्मारूप आहे. म्हणूनच आत्मास्वरूप आनंद हा नेहमी समस्त जीवाचा परमार्थपुरुष आहे. असा सर्व जीवाचा परमात्मा परमपुरुष, ज्याला सर्वदा सर्वचजण पूजतात. ज्याचे सर्वदा ध्यान केले जाते तोच परमपुंस नरवेष धारण करून प्रज्ञापुरी प्रकटला. वावरला.
श्रीस्वामी समर्थ महाराज जगदोद्धारासाठी अक्कलकोटात स्थिरावले. खरोखरीच अक्कलकोटच्या भाग्योदयाला काही पार नाही. ज्याप्रमाणे गोकुळात श्रीकृष्ण लीला करीत फिरले. नंदगोप व्रजादिकांनी पूर्णब्रह्म सनातन मित्र जोडला. तसेच परमानंद
क्रमशः
संजय वेंगुर्लेकर
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय १९ वा*
कानिफाकडून गोरक्षाला कळाले होते की, मच्छिंद्रनाथ खीराज्यात आहे. तेव्हा तो तत्काळ देशामागून देश ओलांडीत खीराज्याच्या सीमेवर पोहोचला. तो त्याला काही नर्तिका आत जातांना दिसल्या. त्यातली मुख्य होती तिचे नाव होते कलिंगा. ती म्हणाली, "आम्ही खी राज्यात जात आहोत. मैनाकिनी राणीसमोर नृत्यकला दाखवून आम्ही तिजकडून पुष्कळ धन मिळवून सुखी होऊ." गोरक्ष म्हणाला, "मी तुमचा साथीदार होतो" तुला काही कला येते का? गोरक्ष म्हणाला. "मी गायन करीन, मृदुंग वाजवीन." ती म्हणाली, असे म्हणतोस तर येथेच दाखव तुझे कौशल्य." गोरक्षाने भस्म मंत्रून कपाळाला लावले, ओठांना लावले, दाही दिशांना फेकले व वाद्याला लावले. त्याने गंधर्वप्रयोग केला होता. त्यामुळे असा चमत्कार झाला की, वृक्ष व दगडसुद्धा गायन करू लागले, वाद्ये वाजवू लागले. तो वनभाग स्वरांनी भरून गेला. तो प्रकार पाहून कलिंगा चकित झाली. तिला त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला. तिने मनात विचार केला, आपण याच्याच संगतीत राहावे. आपले कल्याण होईल. गोरक्षाला नाव विचारले पण गोरक्षाने 'पूर्वडा' असे आपले खोटेच नाव सांगितले. आपले खरे नाव सांगितले तर उगीच अडचण येतील, असे त्याला वाटले. गोरक्ष तिला म्हणाला, "मी बैरागी आहे, विषयभोग मला नको आहेत. धनसंपदा मला नको. एका वेळेस पोटापुरते मिळाले की झाले."
कलिंगा म्हणाली "ठिक आहे तेवढी गरज सहज भागेल. तू एक मात्र लक्षात ठेव. स्त्रीराज्यात तुला पुरूषवेषाने येता येणार नाही. तेथे पुरूष मरतात. मारूती भुभुःकार करतो. त्याचा प्रभावच असा आहे की त्यामुळे खिया गर्भ धारण करतात. पण मुलगा असला तर मरतो. मुलगीच फक्त जगते." गोरक्ष म्हणाला, "मारूतीचे भय मला नाही. तुम्ही चिंता नका करू. माझे योगबळ जास्त आहे." मग त्याने कलिंगा व इतर नर्तिका यांसह रथात बसून खीराज्यात प्रवेश केला. त्याने सीमेवरच वज्रास्त्र, स्पर्शाख, मोहनाख व नागाख यांचा संरक्षक प्रयोग करून ठेवला. ती सर्वमंडळी व गोरक्ष यांनी चिनापट्टण या गावात पहिल्या रात्री वस्ती केली. एक प्रहर रात्र झाली, चंद्र उगवला, चांदण्या रात्रीला सर्वजण निजलेले असतांना मारूती खीराज्यात शिरण्यासाठी सीमेवर आला. तोच वज्रास्त्र त्याच्या छातीवर आवळले. तो खाली पडला तोच स्पर्शाखामुळे जमिनील चिकटून राहिला. मोहनाखामुळे त्याला आपण कशासाठी आलो याचा विसर पडला आणि नागास्त्राने हातापायांना विळखा पडून मारुतीचे प्राणही कासावीस झाले. तेव्हा "हा कोणी तरी महाप्रतापी योगीच आपला शत्रू असावा व यातून सोडविणारा केवळ आपला रामप्रभूच आहे, दुसरा कोणी नाही." असे स्मरण होऊन मारूती रामाचा धावा करू लागला.
तेव्हा भक्ताच्या हाकेने श्रीराम तेथे प्रकट झाले. त्यांनी इंद्राखाने वज्रास्त्र निवारण केले, विष्णूच्या रुपाने मोहनाख, गरुडाखाने नागाख व विभक्ताखाने स्पर्शाख नाहिसे केले. मारुती सावध झाला. त्याला श्रीरामाचे दर्शन झाले. मारुती व श्रीराम 'हे अखबळ कोणाचे?' याचा विचार करू लागले. श्रीरामाने अंतर्ज्ञानाने जाणले की, नवनाथांपैकी हरि अवतार जो गोरक्ष त्याचेच हे कृत्य आहे. तो स्त्रीराज्यात आला आहे व चिनापट्टण गावात बस्तीला आहे. त्याने मारुतीला सांगितले. तेव्हा मारूती म्हणाला, "मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथ परत घेऊन जाईल. तेच टाळावयाचे आहे. तुम्ही मधुर बोलून त्याचे मन वळवा, माझी भक्ताची ही प्रार्थना ऐकाच!" श्रीरामाने मान्य केले व दोघे शाखे जाणणाऱ्या ब्राह्मणांची रुपे घेऊन चिन्नापट्टण गावात गेले. गोरक्ष निजला नव्हता. तो मच्छिंद्रनाथाचे स्मरण करीत एकटाच निवांत बसून आनंदाने डोलत होता. त्याच्यासमोर दोघे आले व त्याला नमस्कार करून बसले. मग गोरक्षाची श्रीरामाने प्रशंसा केली. त्याच्या दया, क्षमा, शांति, विरक्ति, विनय, निर्वैरीपणा आदि गुणांची फारच वाखाणणी केली. गोरक्ष प्रसन्न मनाने म्हणाला, "मित्रहो, मी तर स्वतःच बैरागी. मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा." ते म्हणाले, "आम्ही सांगू, पण तू नाकारशील. आम्ही याचक ब्राह्मण, तू वचन दे, मग सांगतो." गोरक्ष मोठा सावध होता.
तो विचार करू लागला, "या स्त्रीराज्यात पुरुष कसा येईल? आला तर मरेल. बरे सीमेवर आपण अखे पेरली आहेत. कसा येईल? देवता सुद्धा त्यात अडकतील. मग रात्री-अपरात्री हे ब्राह्मण येथे येतात नि माझी प्रशंसा करतात. मी एकटाच यांना हवा आहे. यांचा हेतू तरी काय असेल? हे कोणीतरी महान देवच असतील. मी मच्छिंद्राला नेण्यास आलो आहे. ते सोडून दुसरे काहीही बोलणे यांनी काढले तरी चालेल." मग तो मोठ्या विनयाने त्या ब्राह्मणांच्या पाया पडून म्हणाला, "स्त्रीराज्यात कोणीही पुरूष येणार नाही. मी पेरलेली अख्खे ओलांडून सुद्धा तुम्ही आलात, तेव्हा तुम्ही ब्राह्मण नव्हे. तुम्ही साक्षात विष्णू, महेश किंवा ब्रह्मदेव असाल. माझ्याजवळ ही माझी नाथपंथाची सामग्री तेवढी आहे. तुम्हाला मी काय वचन देणार?" असे बोलून तो त्यांच्या पाया पडला. श्रीरामाने मारुतीला खुणेने असे दाखविले की, आता आपले खरे स्वरुप याला दाखविले पाहीजे. मग श्रीराम व मारुती तिथे स्वतःच्या रुपातच प्रकट झाले. श्रीरामाने गोरक्षाला प्रेमाने आलिंगन दिले व म्हटले, "गोरक्षनाथ, मैनाकिनीने मारुतीकडून वरदान मिळवले आहे, वचन घेतले आहे व तुझे गुरु मच्छिंद्र यांना मागून घेतले आहे. तू इथे आला आहेस, पण मच्छिंद्रनाथांना तू परत नेऊ नयेस अशी मारुतीची इच्छा आहे. "
गोरक्ष म्हणाला, "तुमचे म्हणणे तुमच्या दृष्टीने ठिक आहे. पण आम्ही नाथपंथी. मच्छिंद्राने स्त्रीविलासात रमून रहावे हा आमच्या पंथाला काळिमा आहे. मी त्याला घेऊन जाणारच. तुम्ही काहीही म्हणा. आकाश खाली कोसळले, मेस्मांदार फुटून त्याचे तुकडे झाले, पृथ्वीप्रलय झाला तरी यात बदल होणार नाही. सांगून ठेवतो." हे त्याचे निर्धाराचे वचन ऐकून मारुती फारच संतापला होता, पण श्रीराम त्याला म्हणाले, "बायुपुत्रा, हे नाथपंथी माझे प्रिय भक्त आहेत. तू पण माझा भक्त आहेस. अरे, त्यांच्या कार्यात तू अडथळा आणणे योग्य नव्हे. राग आवर." श्रीराम मग गोरक्षाला म्हणाला, "गोरक्षनाथा, तुम्ही आपसात भांडू नका. मी आता स्वस्थानी जातो." तेव्हा गोरक्ष भावनेने भरून जाऊन म्हणाला, "प्रभू रामचंद्रा, मी अखे मंत्रून सीमेवर तुमच्या भक्ताला अडविले. तो माझा प्रमाद आहे. मला क्षमा करावी. माझी अत्रे काढून टाकण्यासाठी स्वतः रामप्रभुना श्रम पडावे? मला क्षमा करा." गोरक्षाचा विनयशील स्वभाव पाहून श्रीरामाने त्याला पुन्हा प्रेमाने पोटाशी धरले. त्याला निरोप देऊन तो आपल्या ठिकाणी गेला.
आरत्या म्हणून संपल्या कि आपल्याला वाटते आता कापूर लावुन कर्पूरगौरं म्हणायचे पण नाही त्याचा अर्थ कितीवेगळा *ब-याच* जणांना माहित नसतो
आपणही त्यातलेच
पण वाचा
*.....कर्पूर आरती!.....*
*कर्पूर आरतीचे अर्थानुसंधान!*
*कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि।*
*मन्दारमालाकुलतालकायै कपालमालांकितशेखराय दिव्याम्बरायै च दिगंबराय नम: शिवायै च नम: शिवाय।।*
मुख्य आरतीनंतर 'कर्पूर आरती' म्हणून म्हटल्या जाणा-या या आरतीचा कापूराशी काही संबंध नाही. केवळ सुरुवात 'कर्पूर' शब्दाने होते इतकेच.
हे भगवान शिवपार्वतीचे एक अतिशय सुरेख स्तवन आहे. अर्थानुसंधान ठेवले तर या स्तवनाने अधिक आनंद मिळतो.
१. कर्पूरगौरं : कापूराप्रमाणे शुभ्र, पवित्र असलेली गौरवर्णा (पार्वती,)
२. करुणावतारं : करुणेचा साक्षांत अवतार असलेले (शिव शंकर)
३. संसारसारं ( सार-असार सहित)
४. भुजगेन्द्रहारं : भुजंगाचा हार परिधान करणारे (शिव शंकर)
५. सदा वसं तं हृदयारविन्दे : तुम्ही माझ्या हृदयकमलात सदा निवास करावा (यासाठी)
६. भवं - शिवाला
७. भवानिसहितं - पार्वतीसह
८. नमामि-- नमन करतो, वंदन करतो.
९. मंदारमालाकुलतायकायै- मंदार पुष्पकलिकांच्या मालांनी सुशोभित (अशी) पार्वती, (आणि)
१०. कपालमालांकित शेखराय - नरमुंडमाला परिधान केलेले शिवशंकर
११. दिव्यांबरायै - दिव्य वस्त्र परिधान केलेली (पार्वती)
च - आणि -
१२. दिगंबराय - दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे अशा शिव शंकरांना नमन करतो. नम:
१३.शिवायै - पार्वती -च -आणि
१४ नम: शिवाय - शंकराला
वंदन करतो.
(पार्वती आणि शिवशंकर यांना अभिवादन करतो.)
*हे सुंदर स्तवन अनेकदा भरपूर अपभ्रंशांसह सरसकट म्हटले जाते. याचा अर्थ समजून घेणे नक्कीच आनंददायक आहे.*
🙏🏻🙏🏻
*🔸गौरीपूजन.🔸*
*गौरीपूजन हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे... गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात.....*
*गौरी शब्दाचा अर्थ...*
*संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या... तसेच गौरी म्हणजे पार्वती, पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते.....*
*व्रताचे स्वरूप...*
*भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/ गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात... ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात....*
*आख्यायिका आणि इतिहास...*
*हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे... अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई, असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे. ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे.....*
एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली... त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.....*
*स्रोत: विकिपीडिया...*
*🔸ज्येष्ठा गौरी पूजन.🔸*
*अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात... तीन दिवस साजरा केल्या जाणार्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्या दिवशी विसर्जन करतात.....*
पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या... तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.....*
हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते... अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात.....*
गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात... थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.....*
महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात... हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात.....*
माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे... माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो. अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.....*
तिसर्या दिवशी खीर- कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात... परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.....*
*आंतरजाल...*
*🔸समृद्धीच्या पावलांनी गौराई आल्या.🔸*
गणेशाच्या आगमनानंतर वेध लागले होते ते गौरींच्या आगमनाचे... वाजतगाजत, हळदीकुंकवाचे सडे घालत गौराईंची घराघरांत प्रतिष्ठापणा करण्यात आली. आता दोन दिवस गौराई घरात राहून आशीर्वाद देणार आहेत.*
‘पाऊस पडू दे, गंगा भरू दे, भादव्यात मी येईन गं... तेरड्याच्या फुलांवर, वस्ती मी करीन गं’ गेले महिनाभर असा निरोप पाठविणारी गौराई माहेरी आल्याने सगळीकडे आनंदी आनंद झाला आहे. गौराईला आणण्यासाठी फुलोरा घेऊन नदीवर, पाणवठ्यावर माता-भगिनींनी एकच गर्दी करतात. फुले, आघाडा, दुर्वा, कण्हेरीच्या फुलांच्या माळांनी सजविलेले, लखलखीत घासलेले तांब्या-पितळेचे न्हावण घेऊन आणि जरीच्या साड्या, अंगभर दागिने, हातभर बांगड्या लेवून गौराई गीते गात सर्वत्र हा सोहळा रंगतो.*
हिरवा शालू, नथ आणि विविध अलंकारांनी नटलेल्या या महिला आणि मुलींच्या सामूहिक आविष्काराला गौराई गीतांची सुरेल साथ लाभल्याने अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने घडते. झेंडू, गलाडासह विविध फुलांनी बाजारपेठ फुलते. फुलांचे प्रतिकिलो दर गगनाला भिडतात.*
ग्रामीण व शहरी भागात गौरीचे मुखवट्यांऐवजी काही ठिकाणी एरंडाची पाने वापरली जातात. काळानुरूप या मुखवट्यात बदल झाला असून, गौरीला आता टेक्नॉलॉजीचा स्पर्श होत आहे. त्यातूनच त्यांचे सुबक, रेखीव, अलंकारयुक्त असे मुखवटे उपलब्ध झाले आहेत. बाजारपेठांतील दुकानातून मुखवटे विक्रीस असतात.*
*गौरींपुढे झाली आरास*
*चैत्रागौरीसारखी आरास गणपती गौरींपुढेही करण्यात येते. लाडू, चकल्या, करंज्या यांसारख्या दिवाळीतल्या पदार्थांचीही या काळात रेलचेल असते. काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवण्यात येतात. काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात, तर काहींच्या घरी उभ्या. उभ्या महालक्ष्म्यांना पितळी किंवा लाकडी स्टॅण्डही असून, कोणी कोठ्यांना साड्या नेसवून त्यावर मुखवटे बसवतात. काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर काही पितळी तर काही लाकडाचे असतात. कोठ्यांना साड्या नेसवताना त्या कोठ्या लाडू, करंज्यांसारख्या मिष्टांन्नांनी भरून ठेवण्याची पद्धत काही भाविकांकडे पहायला मिळते.....*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
[31/08, 8:19 pm] +91 94201 13373: ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
*🔸कोकणात गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, कारण…*
*महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले चार लोकं एकत्र आले न की मग आमच्याकडे असं आणि तुमच्याकडे तसं हे विषय रंगतात... असाच विषय काल रंगलेला. निमित्त होतं गणपती आणि गौऱ्यांचं. आत्ता काही भागात गौराई न म्हणता लक्ष्मी म्हणतात. तर काही ठिकाणी गौरा म्हणतात. यावरूनच विषय सुरू झाला....*
मराठवाड्यातल्या लोकांनी त्यांच सांगितलं, पार गडचिरोलीमधल्या दोस्ताने तिकडच्या प्रथा सांगितल्या पण इटंरेस्टिंग वाटली ती कोकणातील प्रथा. कारण कोकणातल्या गड्यानं सांगितलं आमच्याकडे गौराईला चिकन, मटण असा नैवेद्य असतो.....*
कस शक्य आहे चिकन मटण ते पण थेट देवाला. म्हसोबा, बिरोबा अशा देवांना बकरं लागतं हे माहित होतं पण गौराईला पण ही गोष्ट पचायला थोडी जड होती त्यामुळं विस्ताराने शोध घ्यायचं ठरवलं तेव्हा कारण समोर आलं.....*
कारण आहे पौराणिक कथेचं.... या कथेनुसार पार्वती देवीचं लग्न महादेवासोबत अर्थात शंकरासोबत झालं... आत्ता शंकर हा स्मशानात राहणारा देव. लग्नानंतर पार्वती आपल्या माहेरी जाण्यासाठी निघाली. वाटेत पार्वतीच्या रक्षणासाठी महादेवांनी आपल्यासोबत स्मशानात असणाऱ्या भूतगणांना पाठवलं. या भूतगणांनी पार्वतीचं रक्षण केलं आणि पार्वती मातेला सुखरूप तिच्या माहेरी सोडलं.....*
माहेरी आल्यानंतर पार्वतीसाठी गोडधोड पदार्थ बनवण्यात आले. कौतुकसोहळा सुरू झाला... पण माहेरच्या लोकांच लक्ष्य भूतगणांकडे गेलच नाही. भूतगणांच्या जेवणाचं काय? नेमकं हे हेरलं ते माता पार्वतीने…..*
*तिने भूतगणांच्या जेवणाची सोय केली... मात्र भूतगण स्मशानात रहात असल्याने मांसाशिवाय ते दूसरं काहीच खात नसतं. त्यामुळे या भुतगणांना मांस देण्यात आलं. त्यामुळेच प्रथा पडली ती गौराईला मांसाहाराचा नैवेज्ञ द्यायची.*
*वास्तविक हा नैवैज्ञ गौराईसोबत आलेल्या भूतगणांना असतो... पण पौराणिक कथा माहित नसल्याने गौराईसाठीच हा नैवेज्ञ असल्याची मान्यता रुढ होत गेली.....*
*स्रोत: आंतरजाल, बोलभिडु...*
*🔸श्रीमहालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय?🔸*
*ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक.*
*भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस श्रीमहालक्ष्मी असे संबोधले जाते. या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन जेष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते. पुराणात थोडेफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती श्रीमहालक्ष्मी विषयी उपलब्ध आहे.*
जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठा लक्ष्मी म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली- वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात.*
*नोट :-*
*भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्रीलक्ष्मी हे जेष्ठागौरी आहे पण जेष्ठागौरी श्री शंकरांची पत्नी म्हणजे देवी पार्वती म्हणजे जेष्ठागौरी आहे यांचे पुजन चैत्र सह जेष्ठ महिन्यात व श्री मंगळागौर ही श्रावण महिना पुजन करण्यात येते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या दोन श्रीमहालक्ष्मी कश्या या बद्दल श्री वेद वाड्मयत सुद्धा ‘नमो जेष्ठाच च कनिष्ठाय च’ ‘स्तेतानां पतये नमः’ अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्यभाव मनात बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.*
*मी समुद्र मंथन या लेखात सांगितल्या प्रमाणे मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्याची बहीण श्रीअलक्ष्मीचा जन्म झाला. श्रीमहालक्ष्मी म्हणजे (येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी) आणि श्रीअलक्ष्मी (म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्रीअलक्ष्मी) असे म्हणतात.*
याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्रीविष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थ(पिंपळाचे झाड) वृक्षा खाली रडत बसली.*
तिथुन श्रीविष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते.*
*या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो. श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचेआवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात. जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.*
अष्टमीच्या दिवशी श्रीलक्ष्मी पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीच म्हणतात. लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मद मस्त, जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वांवरील उतारा म्हणजे ‘श्रीमहालक्ष्मी व्रत’ असे मानतात.*
श्रीमहालक्ष्मी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला आहे. श्रीमहालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो.*
*प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास.*
गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.*
*पुजन माहिती.*
श्रीमहालक्ष्मीचे आवाहन.*
*श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार प्रवेश दारातुन अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणलं जातं.*
*देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभं केलं जातं. श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचेदेखील बनविलेले असतात . श्रीमहालक्ष्मीना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात.*
श्रीमहालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्रीलक्ष्मी च्यापुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात.*
*श्रीमहालक्ष्मी पुजन माहिती.*
दुसर्या दिवशी जेष्ठा नक्षत्रावर आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणा कडे सकाळी, दुपारी, किवा संध्याकाळी किवा रात्री महापुजन करतात यात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.*
तिसर्या दिवशी तिला खीर कानवल्याचा( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी (विसर्जन) करतात. अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.*
श्रीमहालक्ष्मीची कहाणी.*
( ही कहाणी दुसर्या दिवशी महापुजन झाल्यावर वाचावी..)*
*आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी श्रीमहालक्ष्मी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी श्रीलक्ष्मी आण! आई म्हणाली, बाळांनो, श्रीलक्ष्मी आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई श्रीलक्ष्मी आणेल!*
वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.*
बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.*
सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.*
*म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्या दिवशी खीर केली.*
संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!*
श्रीमहालक्ष्मी नं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. श्रीमहालक्ष्मी आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठाअलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.*
*स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.....*
*🔸चौदा विद्या, चौसष्ट कला.🔸*
*श्री गणेश हे चौदा विद्या, चौसष्ट कलांचे दैवत आहे... श्रीगणेशाचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण श्रीगणेशपूजा करीत असतो... पण गणरायाच्या या चौदा विद्या, चौसष्ट कला तुम्हाला माहिती आहे का चौदा विद्या .....?*
श्रीगणेश विषयक माहिती असलेले प्राचीन ग्रंथ श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्गलपुराण हे आहेत... आजही हे प्राचीन ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत.....*
श्रीगणेशांना चौदा विद्या अवगत होत्या, श्रीगणेश मोठे ज्ञानी होते... ज्याच्याजवळ जे असते तेच तो दुसर्याला देऊ शकतो. श्री गणेश स्वत: ज्ञानी व प्रगल्भ बुद्धिमान असंल्यामुळेच त्यांचा आदर्श आपण ठेवला, तर आपणही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करू लागतो. अधिक बुद्धिमान होण्यासाठी अधिक मेहनत घेऊ लागतो. श्रीगणेशाला बुद्धिदाता म्हणजे बुद्धी देणारा असे म्हटले आहे.....*
श्रीगणेशांना पुढील चौदा विद्या अवगत होत्या... (१) ऋग्वेद (२) यजुर्वेद (३) सामवेद (४) अथर्ववेद (५) छंद (६) शिक्षा (७) व्याकरण (८) निरुक्त (९) ज्योतिष (१०) कल्प (११) न्याय (१२) मीमांसा (१३) पुराणे आणि (१४) धर्मशास्त्र.....*
काही विद्वानांच्या मते पुढील चौदा विद्या श्रीगणेशाला अवगत होत्या...*
*(१) आत्मज्ञान (२) वेदपठण (३) धनुर्विद्या (४) लिहीणे (५) गणित (६) पोहणे (७) विकणे (८) शस्त्र धरणे (९) वैद्यक (१०) ज्योतिष (११) रमलविद्या (१२) सूपशास्त्र (१३) गायन आणि (१४)गारुड.*
आणखी इतर ग्रंथांमधून वेगवेगळ्या विद्या सांगितलेल्या आहेत... आधुनिक काळांत विद्यांची संख्याही अनेक पटीने वाढली आहे. यावरून एकच म्हणता येईल की, गणपती हे सकल विद्यांचा अधिपती होते. सकल ज्ञानी होतज. बुद्धिमान होते. म्हणूनच अथर्वशीर्षामध्ये श्रीगणेशांना ‘ तू ज्ञान आहेस ‘ असे म्हटले आहे.....*
श्रीगणेशांना चौदा विद्यांबरोबरच चौसष्ट कलाही अवगत होत्या... शिवतत्त्वरत्नाकर ग्रंथामध्ये पुढील चौसष्ट कला सांगितलेल्या आहेत.....*
(१) इतिहास (२) आगम (३)काव्य (४) अलंकार (५) नाटक (६) गायकत्व (७) कवित्व (८) कामशास्त्र (९) दूरोदर (१०) लिपिज्ञान (११) लिपिकर्म (१२) वाचन (१३) गणन (१४) व्यवहार (१५) स्वरशास्त्र (१६) शाकुन (१७) सामुद्रिक (१८) रत्नशास्त्र (१९) गंज-अश्व-रथ-कौशल (२०) मल्लशास्त्र (२१) सूपशास्त्र (२२) बागाईत (२३) गंधवाद (२४) धातुवाद (२५) रससंबंधी (२६) बिलवाद (२७) अग्निसंस्तम्भ (२८) जलसंस्तम्भ (२९) वाक् स्तंम्भन (३०)वायुस्तंभन (३१) वशीकरण (३२) आकर्षण (३३) मोहन (३४) विद्वेषण (३५) उच्चाटन (३६) मारण (३७) कलवंचन (३८) परकायाप्रवेश (३९) पादुकासिद्धी (४०) वाक्सिद्धी (४१) गुटिकासिद्धी (४२) ऐन्द्रजालिक (४३) अंजन (४४) परदृष्टिवंचन (४५) स्वरवंचन (४६) मणिभूमिकर्म (४७) मंत्रऔषधी (४८) कर्म (४९) चित्रक्रिया (५०) लेहक्रिया (५१) अश्मक्रिया (५२) मृत्क्रिया (५३) औषधक्रिया (५४) वेणुक्रिया (५५) चर्मक्रिया (५६) अम्बरक्रिया (५७) अदृश्यकरण (५८) दन्तिकरण (५९) मृगयाविधी (६०) वाणिज्य (६१) पशुपालन (६२) कृषी (६३) आसनकर्म (६४) युद्धकौशल्य.....*
आधुनिक कालात कलांची संख्याही अनेकपटीने वाढली आहे... या काळात माणसाने एक तरी कला आत्मसात करणे आवश्यक आहे. आयुष्यात प्रत्येकाला आवडीच्या विषयातील नोकरी मिळतेच असे नाही. पण आवडीच्या विषयाची कला मात्र जोपासता येते. दु:खाच्या वेळी अवगत असलेली कला मनाला आधार देते तर सुखाच्यावेळी कला माणसाचे सुख द्विगुणित करीत असते.....*
*स्रोत: आंतरजाल, By शरयू काकडे...*
*श्री नवनाथ कथा सारांशः अध्याय १८ वा*
गोपीचंद राज्यत्याग करून निघाला आहे. ही बातमी त्याच्या देशात सगळीकडे पसरली. जो तो राजाला थांबवून घेऊन राहण्याचा आग्रह करीत होता. नाना पकाने अर्पण करीत होता, पण त्या विरक्त महापुरूषाने मिक्षाच तेवढी घेतली. कोठेही तो जास्त वेळ थांबला नाही. गौड देश मागे पडला. कौल देश लागला. तेथे पौलपट्टण गाव राजधानीचे होते. तेथील राजा तिलकचंद महाबलाढ्य, पराक्रमी व मोठे सैन्य बाळगून होता. गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती. तेथेही गोपीचंदाची बातमी आधीच कळली होती. पण तेथे राजा व चंपावतीचे सासरे, सारे लोक गोपीचंदाची निंदाच करू लागले. भावाची निंदा ऐकून चंपावतीला फार दुःख झाले, पण करणार काय! ती मुकाट्याने बोलणी खात होती. गोपीचंद पौलपट्टणात गेला व एका पाणवठ्याजवळ जाऊन बसला. 'जय गुरूदेव!' असे नामस्मरण तो करीत होता. चंपावतीच्या दासी तिकडून जात होत्या. त्यांनी त्याला पाहिले व ओळखले आणि चंपावतीला तसेच तिलकचंदाला व चंपावतीच्या पतीला पण सांगितले. राजाला बाटले, "हा सुनेचा भाऊ गावात भिक्षा मागेल, तर आपले हसे होईल. आपल्याला तोंड बाहेर काढणे नको होईल." त्याने सेवकांना सांगीतले, "अरे, तुम्ही त्या गौडदेशाच्या भिकारी राजाला पागेत आणून ठेवा. पण त्यापेक्षा चंपावतीच्या स्वतःच्या दासींना पाठवा. त्याचं हे काम करतील." झाले. अशी आज्ञा देऊन राजा राजसमेत गेला. चंपावतीच्या दासी गोपीचंदाला बोलवायला गेल्या. गोपीचंदाने म्हटले, "आम्ही बैरागी! आमच्या बहिणी सर्वच घरी! चंपावती काय वेगळी?" दासी म्हणाल्या, "महाराज, तुमच्या बहिणीचे मन मोडू नका!" मग एकदा स्वतः भेटून चंपावतीचा निरोप घेऊन जावे, असे म्हणून गोपीचंद राजवाड्यात गेला. मग राणीने उत्तमोत्तम अन्नपदार्थ वाढून त्याला भोजन पाठवले. एका तरूण दासीने ते ताट गोपीचंदाला नेऊन दिले व म्हटले, "महाराज, जेवण करा. गोपीचंदाला अपामर वाटले, "या सोयऱ्यांनी मला अपमानाने पागेत बसविले आणि दासीने अन्न आणून दिले." पण पुन्हा त्याने विचार केला, "मी तर आता राजा नाही, मी जोगी. मला सारे सारखे. शत्रु-मित्र हा भेद नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म. त्यात काहीच दोष नाही." आणि त्याने गुरूस्मरण करून अन्नाचा घास घेतला. दासींनी चंपावतीला हळूच बोलावून गवाक्षातून तो बैरागी भाऊ दाखविला व मग त्या दूर गेल्या. "तो तुमचा भाऊ ना? राजा ना? मग येथे का ओशाळ्यासारखे खात बसलाय ? त्याला जोगी कुणी हो केलं? तुम्हाला हा भणंग भिकारी भाऊ पाहून काहीच कसं वाटत नाही?" इत्यादी प्रकाराने हिणवून त्या चंपावतीला प्रश्न विचारू लागल्या. मग तिच्या नणंदा, जावा याही तिच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. ते कटू शब्द ऐकून चंपावतीला भयंकर दुःख वाटले, राग व दुःख यांच्या तिरीमिरीत तिने एकटी असतांना आपल्या पोटात खंजीर खुपसून घेतला. ती धाडकन जमिनीवर पडली. रक्ताचे थारोळे झाले. ती गतप्राण झाली. दासी मग अंतःपुरात गेल्या. पाहातात तो काय, चंपावती तिच्या महालात मरून पडलेली, हातात खंजीर तसाच. दासी एकदम किंचाळल्या. सगळ्या राजवाड्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली. सगळे सेवक, दीर, नणंदा व जावा नाना तर्ककुतर्क करू लागल्या. "भावाच्या अपमानाने चंपावतीने जीव दिला" असे कोणी म्हणू लागले. "गोपीचंद आला नी ही सून मेली." म्हणून त्यालाच कोणी अपशकुनी म्हणू लागले. राजवाड्यात झालेला कोलाहल घोडशाळेपर्यंत पोहोचला. "चंपावती राणीने खंजीर खुपसून जीव दिला. तिचा गोपीचंद नावाचा भाऊ आपले राज्य सोडून भिकाऱ्यासारखा भटकतो, त्याचे तिला फार दुःख झाले." गोपीचंदालाही ही हकीकत समजली. त्याला फार वाईट वाटले. 'आपण येथे आलो नि चंपावतीच्या मरणाला कारण झालो, या गोष्टीचा विसर कोणालाच पडणार नाही. हे काही ठीक नाही.' अशा विचाराने त्याला बाईट वाटले. इकडे चंपावतीचे प्रेत जाळण्यासाठी लोक स्मशानाकडे नेत होते. गोपीचंदही उठला व त्या लोकांबरोबर गेला, 'नाथपंथाचा तिरस्कार व हेटाळणी
करणाऱ्या या लोकांना चमत्कार दाखवून त्यांची तोंडे बंद करावी' असे गोपीचंदाने ठरविले. तो चंपावतीच्या प्रेताजवळ उभा राहिला व लोकांना म्हणाला "लोकहो, मी चंपावतीला पुन्हा जिवंत करतो. तुम्ही थांबा. माझे गुरू जालंदरनाथ यांना येथे आणतो." पण लोकांचा विश्वास बसेना. ते म्हणू लागले, "मृत माणूस कधी जिवंत होणार आहे का?" तो वारंवार सांगत होता, तरी त्याचे कोणी ऐकले नाही. "चार दिवस धीर धरा, मी आत्ता जातो. जालंदर ऋषींची सिद्धी अपूर्व आहे." असे तो अगदी जीव तोडून सांगत होता. तरी लोकांनी चिता रचली व चितेला अग्नी देण्याची तयारीसुद्धा केली. तेव्हा गोपीचंद स्वतः चितेवर जाऊन बसला व ओरडला, "जाळता ना? मग मला पण जाळा. मी जळलो तर मग पाहा जालंदर येईल आणि तुमचे भस्म करील!" लोक म्हणू लागले, "गोपीचंद बेडा झालाय." तिलकचंद राजा म्हणाला, "हा बैरागी गुरूच्या नावाने गर्व करतोय. काय रे काय चमत्कार करशील?" तो म्हणाला, "गुरू बोलतील तसे होईल." मग तिलकचंद म्हणाला, "चंपावतीच्या प्रेताचा डावा हात काढा. याला द्या. तो घेऊन हा गुरूकडे जाईल. चितेवरून खाली उतर" असे म्हणून तिलकचंदाने प्रेताचा डावा हात तोडून दिला व त्याला जायला सांगितले. तो येई पर्यंत प्रेत न जाळण्याचे व राखून ठेवण्याचे कबूल केले व गोपीचंद हेलापट्टण नगरापासून पाच कोसापर्यंत आला. त्याच्या हाती बहिणीच्या प्रेताचा डावा हात होता. हा नगरात आला तर सगळीकडे नसता बोभाटा होईल, हे जालंदराने अंतदृष्टीने जाणून प्रयाणास्त्र जपून भाळी भस्म लावून तो योगी वायुवेगाने गोपीचंदाला वाटेतच भेटला व त्याने "का आलास?" असे त्याला विचारले. गोपीचंदाने सर्व वृत्त सांगीतले. मग जालंदर गोपीचंदासह पौलपट्टणाला वायुवेगाने आला. राजप्रासादाच्या अंगणात ते शिरले. तेथे सर्व लोक शोक करीत होते. दोघांना पाहून ते लगेच उठले. तिलकचंद चकित झाला. "चार दिवसां ऐवजी प्रहराच्या आत गोपीचंद व जालंदर आले. बाप रे! हा योगी केवढा तेजस्वी दिसतो!" असे मनाशी म्हणत राजा धावला. तो जालंदराला फार सन्मानाने वागवू लागला. पण त्याने केलेला हा सत्कार दांभिक होता. गोपीचंदाचा त्याने केवढा अपमान केला नी त्याच्या बहिणीला किती मनस्ताप दिला व त्यामुळे तीने जीव दिला, हे जालंदराला कळाले होते. प्रेताचा हात हातात घेऊन जालंदराने संजीवनी मंत्र म्हटला व भस्म त्या हातावरच टाकले व तत्काळ "चंपावती, चल उठून ये!" असा आदेशही दिला. त्यावेळी आश्चर्य असे झाले की चंपावती चितेवरून उठून क्षणार्धात तिथे आली. हे अपूर्व योगसामर्थ्य पाहून राजासह सर्वजण जालंदरनाथाचा जयजयकार करू लागले. नंतर जालंदर पुन्हा हेलापट्टणास जाण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्या दयेची भीक मागून तिलकचंदाने "सर्वांनी एकत्र भोजन करावे व मगच नाथांनी जावे." अशी प्रोर्थना केली. ती मान्य करून चंपावतीलाच स्वयंपाक करण्यास सांगितले. पतीसह तिला आपल्याजवळ जेवणासाठी बसवून संजीवनीविद्येचा प्रसाद म्हणून जालंदराने आपल्या पात्रातील घास भरविला व तिला अमरत्व दिले. जालंदराने जातांना सांगीतले, "तिलकचंदा, गोपीचंद पूर्ण तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जात आहे. त्याचा पुत्र मुक्तचंद राज्यावर बसविला आहे. तू त्याचे रक्षण कर." ते राजाने मान्य केले. मग जालंदर हेलापट्टणास परत गेला. तेथे त्याने मुक्तचंदाला राज्यकारभाराचे शिक्षण दिले. मग तो व कानिफ पुन्हा बदरिकाश्रमात पोहोचले. तोपर्यंत बारा वर्षे गेली. गोपीचंदाचे तप पूर्ण झाले होते. मग जालंदराने गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करून घेतले. सर्व विद्या शिकवून, सर्व देवतांना बोलावून त्यांच्याकडून सर्व मंत्रांना वरदाने देवविली. अशी जालंदराने गोपीचंदाची पूर्ण तयारी करून घेतली.
श्री गणेश पुराण कथा (अ)*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
*शुक्ल ब्राम्हणावर कृपा केली*
महोत्कटाच्या अतर्क्य लीला पाहुन काशीनगरातील लोकांना त्याच्याविषयी नितांत आदर वाटत होता. तो मनुष्यरुपाने अवतरलेला देवच आहे. आपण त्याला घरी आणावे, त्याची पूजा करावी, त्याचे उत्तम आदरातिथ्य करावे असे प्रत्येकालाच वाटत होते. एके दिवशी काही मान्यवरांनी राजाची भेट घेतली. महोत्कट तेथेच होता. आलेल्या लोकांचा मनोभाव जाणून त्याला मोठे समाधान वाटले. लोकांनी हात जोडून मोठ्या आशेने राजाकडे पाहिले. त्यांना राजाने हसून संमती दिली. प्रजाजनांना मोठा आनंद झाला. महोत्कटाला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन ती सर्व मंडळी आपापल्या घरी परतली.
काशी नगरात शुक्ल नावाचा एक सत्शील ब्राह्मण राहत असे. तो भिक्षा मागून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवित असे. तो लगबगीने घरी आला व आपली पत्नी विद्रूमा हिला म्हणाला, “आज नगरामध्ये महोत्कटाचे आगमन होणार आहे. तो लोकांची पूजा स्वीकारून प्रत्येकाकडे थोडे थोडे अन्नग्रहण करणार आहे. तो आपल्याकडेही येईल. तू स्वयंपाक तयार ठेव. विद्रुमेस आनंद झाला. तिने उत्साहाने स्वच्छता केली. दारापुढे रांगोळी काढली. भाकरी आणि तांदळाची पेज तयार केली. शुक्ल ब्राह्मणांनी आपल्या जवळचे किडूकमिडूक विकून पुष्पहार, पत्री, वस्त्र, फळे, कंदमुळे, तेल तूप आदी साहित्याची जमवाजमव केली. त्याने दर्भाचे आसन मांडले. महोत्कटाच्या पूजेची सर्व सिद्धता केली. दक्षिणा बाजूला काढली. नित्यकर्मे आटोपून तो विनायकाची वाट पाहू लागला.
महोत्कटाने स्नानादी कर्मे उरकली आणि प्रजाजनांना भेटण्यासाठी तो नगरात प्रवेशला. तो प्रथम शुक्ल ब्राम्हणाच्या घरी गेला. त्याला पाहून त्या ब्राह्मण दांपत्यास परमानंद झाला. त्याला पाहून विद्रुमाला रडू आवरत नव्हते. त्या दोघांचा तो शुद्ध सात्विक भक्तिभाव पाहून महोत्कट प्रसन्न झाला. ब्राम्हणानी त्याची पूजा केली. विनायकाने त्याच्या घरची पेज आणि भाकरी आवडीने खाल्ली. तो निघून जाताच त्या गरीब ब्राह्मणाचे घर सर्व ऐश्वर्याने संपन्न झाले.
ब्रह्मदेव व्यासांना महोत्कटाचे चरित्र सांगत होते. व्यासांनी त्यांना विचारले, “हे विधाता, काशीमध्ये गणपतीचे अनेक निस्सीम भक्त होते, तरीही महोत्कटाने शुक्ल ब्राम्हणाला प्रथम प्राधान्य दिले, असे का?” ब्रह्मदेव म्हणाले, “हे मूने, तो ब्राह्मण सत्शील होता. धर्मानुगामी, प्रेमळ सद्भक्त होता. सर्वसाक्षी महोत्कटाने त्याची अनन्य भक्ती जाणूनच त्याच्या घरची पूजन आदी सेवा स्वीकारली. तो भावाचा भुकेला आहे, भक्तीला वश होणारा आहे. मी तुला या विषयाची एक कथा सांगतो, ती ऐक.”
*भीम व्याधाचा आणि राक्षसाचा उद्धार*
प्राचीन काळी विदर्भ देशातील मंद नगरात भीम नावाचा एक व्याध राहत असे. तो अरण्यात जाऊन शिकार करायचा. त्या नगरात कसलातरी उत्सव साजरा करण्यात येणार होता. त्याप्रसंगी मांसाची उत्तम विक्री होईल असा विचार करून तो व्याध अरण्यात गेला. त्या अरण्यात एका राक्षसाचे वास्तव्य होते. तो या व्याधाला खाण्यासाठी धावला. त्याला पाहताच भयभीत झालेला व्याध प्राणरक्षणार्थ एका शमी वृक्षावर चढून बसला. त्याला गाठण्यासाठी राक्षसही त्या वृक्षावर चढू लागला. त्याच्या भाराने तो वृक्ष कोसळला. दोघेही खाली आपटले. त्यात शमी वृक्षाखाली वामनाने स्थापन केलेली एक गणेश मूर्ती होती. झाड खाली पडताना त्याची बरीचशी पाने त्या मूर्तीवर पडली. त्या पुण्याइने राक्षस आणि व्याध यांच्या सर्व पातकांचा नाश झाला. गणेश कृपेने मुक्त होऊन ते दोघेही गणेशलोकी गेले.
व्यास म्हणाले, “हे विधाता, गणेशमूर्ती वर शमी पत्रे पडल्यामुळे भीम व्याध आणि राक्षसाचा उद्धार झाला, हे कसे? ब्रह्मदेव म्हणाले, “या विषयीचा समग्र वृत्तांत सांगतो, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.” ब्रम्हदेव सांगू लागले.
भीम व्याध एका जन्मात राजा होता. त्याचे नाव होते सांब. सत्ता आणि संपत्ती हाती आल्यामुळे तो राजा उन्मत झाला. एके दिवशी सांब व त्याचा प्रधान शिकारीसाठी गेले होते. ते शिकारीवरून परतत असताना त्यांना गणपतीचे एक पडीक देऊळ दिसले. येथील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राजा दशरथाने कुलगुरू वसिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली होती. हे देवस्थान वरदविनायक या नावाने प्रख्यात होते. राजाने व प्रधानाने त्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याला रानातील रानपुष्प अर्पण केली व नमस्कार केला. त्या दोघांकडून जन्मभरात हे एकच पुण्यकर्म घडले होते. कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला. यमाने नरकात घालून त्यांना असंख्य यातना दिल्या. पुढे कीटक, पशु, पक्षी चांडाळ अशा अनेक अशुद्ध योनीमध्ये जन्म घेऊन ते दोघे व्याध आणि राक्षस झाले. गणेश मूर्तीवर शमीपत्र पडल्यामुळे त्या दोघांचा उद्धार झाला.
ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, “हे मूने, मी तुला भीम व्याधाची कथा सांगितली. त्यामध्ये वामनाचा उल्लेख आहे. आता त्याचे कथानक सांगतो.
श्री गणेश पुराण कथा (ब)*
*वामन अवतार*
हिरण्यकशिपुचा पुत्र प्रल्हाद. विरोचन हा प्रल्हादाचा पुत्र. त्याने सूर्याची आराधना केली. प्रसन्न झालेल्या सूर्याने त्याला एक दिव्य मुकुट दिला व म्हणाला, “विरोचना, जोपर्यंत हा मुकुट तुझ्या मस्तकावर आहे तोपर्यंत तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही.” या वरदानाचा व्हायचा तोच परिणाम झाला. उन्मत्त झालेल्या विरोचनाने नंतरच्या काळात आपल्या दुष्कृत्याने त्रिभुवनाला त्राही त्राही केले. तेव्हा भगवान विष्णूने एका दिव्य लावण्यवतीचे रूप घेऊन त्या दुष्टाला मोहित केले. एकदा स्नानाच्या वेळी त्याच्या अंगाला सुगंधी तेलाने मर्दन करीत असताना तिने अत्यंत लडिवाळपणे त्याला मुकुट बाजूला ठेवण्यास सांगितला. त्या वेळी त्याच्या मस्तकात तेल लावत असताना तिने मुष्टी ने प्रहार करून त्याला जागेवरच ठार केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बली दैत्यांचा राजा झाला.
एके दिवशी त्याने शुक्राचार्याला विचारले, “गुरुदेव, इंद्र हा आमचा भाऊबंद लागतो. पण तो एकटाच स्वर्गसुखाचा उपभोग घेतो, हे कसे? आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. त्यासाठी मी स्वतः काय करावे? ते सांगा. शुक्राचार्य म्हणाले, “हे राजा, इंद्रपद मिळवण्यासाठी तुझ्या पूर्वजांनी अनंत प्रयत्न केले. पण कोणालाही यश आले नाही. तू स्वर्गाच्या राज्यासाठी युद्धादि मार्गांचा अवलंब करू नकोस. मी तुला एक सुलभ उपाय सांगतो. तू शंबर यज्ञ कर. त्या शतऋतूंच्या पुण्यप्रभावाने तुला इंद्रपद प्राप्त होईल.”
शुक्राचार्यांचे बोलणे ऐकून बळीच्या मनात उत्साह संचारला. त्याने भृगु, वशिष्ठ अशा सर्व श्रेष्ठ ऋषींना बोलावून घेतले. त्यांच्याशी विचारविमर्श केला. यज्ञांचा संकल्प करून त्याने विधिवत यज्ञदीक्षा घेतली. नंतरच्या काळात श्रेष्ठ ऋत्विजांच्या मार्गदर्शनानुसार त्याने एका मागोमाग एक याप्रमाणे नव्याण्णव यज्ञ पूर्ण केले. त्याने शंभरावा यज्ञ आरंभिला. तेव्हा देवांना मोठे संकट पडले. इंद्राला पदभ्रष्ट होण्याच्या भयाने ग्रासले. तो भगवान विष्णूंना शरण गेला. विष्णूने त्यांना अभय दिले.
कश्यप पत्नी आदितीच्या उदरात गर्भरूपाने विष्णू प्रविष्ट झाले. तिने एका तेजस्वी पुत्रास जन्म दिला. या नूतन बालकाचे कश्यपाने जातकर्म संस्कार केले. त्याचे ‘वामन’ असे नामकरण केले. यथावकाश त्याची मुंज केली. त्याला वेदविद्या शिकवली.एके दिवशी वामन कश्यपांना म्हणाला, “पिताश्री, देवकार्य हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. मला त्यांची चिंता व संकटे दूर करायचे आहेत.” कश्यप म्हणाले, “बाळा तू गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा जप कर. या मंत्रसाधनेने गणपती तुझ्यावर प्रसन्न होईल.”
काही दिवसांनी एका शुभमुहूर्तावर वामनाने आपल्या पित्याकडून मंत्रोपदेश घेतला. मग तो विदर्भात गेला. तो निराहार राहून गणपतीची भव्य आराधना करू लागला. त्यामुळे तो कृपाळू मंगलमूर्ती त्याला वर्षभरातच प्रसन्न झाला. त्यांनी वामनाला उद्दिष्टपूर्तीसाठी इष्ट वरदाने दिली. वामनाने त्या ठिकाणी एक सुंदर गणेश मंदिर बांधले. मग तो पितृगृही गेला.
सर्वप्रथम तो बलीच्या यज्ञमंडपात आला. कटीसूत्र, मेखला, कृष्णाजीन आणि दंड-कमंडलू धारण केलेली ती बटूवामनमूर्ती पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला. त्याच्या मुखावरील तपश्चर्येचे तेज आणि विलक्षण प्रसन्नता पाहून बलीला ही राहवले नाही. त्याने उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले. वामन म्हणाला, “हे दैत्यराज, मी अनाथ आहे. माझी तुझ्याकडून फार मोठी अपेक्षा नाही. तू मला तीन पावले टाकण्याची जमीन दिलीस तर मी पर्णकुटी बांधून राहील म्हणतो.” सर्व ऐश्वर्याने संपन्न झालेल्या बलीच्या दृष्टीने तीन पावले भूमिदान देणे ही अगदी क्षुल्लक गोष्ट होती.
त्याने बटूला तत्काळ होकार दिला. शुक्राचार्यांना विष्णूचे कपट लक्ष्यात आले. परंतु बळीने होकार दिल्यामुळे शुक्राचार्यांचा नाईलाज झाला. ते स्वस्थ बसले नाहीत. बळीने दानसंकल्प सोडण्यासाठी शेजारीच असलेली पाण्याची झारी आपल्या हाती घेतली. तेव्हा ते सूक्ष्म रूपाने झारीच्या तोटीत जाऊन बसले. त्यामुळे अवरोध उत्पन्न होऊन बटूच्या हातावर संकल्पाचे उदक पडेना. वामनाने शुक्राचार्याची युक्ती ओळखली. त्याने दर्भाची एक काडी झारीच्या तोटीत घातली. ती टोचल्यामुळे शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला. वेदना असह्य होऊन ते त्वरेने बाहेर आले. वामनाने उदकाची झारी बलीच्या हातात दिली. त्याने त्रिपाद भूमी दानाचा आपला संकल्प पूर्ण केला. तेव्हापासून शुक्राचार्य एकाक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले.
संकल्पाचे उदक हाती पडताच वामनाने व्यापकरूप धारण केले. त्याने एका पावलात भुलोक व्यापला, दुसरे पाऊल टाकून स्वर्ग व्यापला, मग त्याने तिसरे पाउल कुठे टाकू? अशी पृच्छा केली. बलीने स्वतःच्या मस्तकाकडे अंगुलीनिर्देश केला.वामनाने तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात दडपले. महाविष्णूच्या पावन पदस्पर्शाने बळी धन्य धन्य झाला. त्याच्या नव्याण्णव महायज्ञांची ती पुण्यवान फलश्रुतीच होती! वामनाने त्याला पाताळाचे अधिपती केले. वामनाने विदर्भ प्रांतात ज्या ठिकाणी मंत्रअनुष्ठान केले होते. तो परिसर अदोषनगर म्हणून प्रख्यात झाले.
श्री गणेश पुराण कथा (क)*
*मंदार आणि शमीका*
वीतीहोत्र नगरात एक वैदिक ब्राह्मण राहत असे. त्याचे नाव औरव. सुमेधा ही त्याची पत्नी. या दाम्पत्यास शमीका नावाची एक कन्या होती. ती सात वर्षांची झाली. तेव्हा त्याने तिच्यासाठी वरसंशोधन आरंभले. धौम्यपुत्र मंदार हा शौनक ऋषींपाशी विद्याभ्यास शिकत होता. तो अत्यंत ज्ञानी होता. औरवाने धौम्याची भेट घेऊन मंदारला शमिका देण्याचा विचार बोलून दाखविला. विवाहाची चर्चा यशस्वी होऊन विवाह संपन्न झाला. मंदार आणि शमिका आनंदाने संसार करू लागले.
एके दिवशी भृशुंडी ऋषी त्यांच्या आश्रमात गेले होते. त्यांच्या भ्रूमध्यातून निघालेली सोंड आणि त्यांची स्थूल देहयष्टी पाहून मंदार आणि शमिकाला हसू अनावर झाले. भृशुंडी ऋषींना क्रोध आला. त्यांनी त्या दोघांना शाप दिला, “तुम्ही माझ्या स्वरूपाला पाहून थट्टेने हसलात, या प्रमादाबद्दल तुम्ही उभयता वृक्ष व्हाल. पक्षीही तुम्हाला स्पर्श करणार नाहीत.” शापवाणी पूर्ण होताच मंदार मंदार वृक्ष आणि शमीकेचे शमी वृक्षात रूपांतर झाले.
या घटनेला महिना होऊन गेला. प्रिय शिष्य मंदाराची कोणतीही कुशलवार्ता कळली नाही, त्यामुळे शौनकांना मोठी चिंता उत्पन्न झाली. त्यांनी आंतरदृष्टीने अवलोकन केले असता सत्य प्रकार त्यांच्या ध्यानात आला. शमिका आणि मंदार यांना मुक्त करण्यासाठी शौनक ऋषी आणि औरव यांनी बारा वर्षे गणेश आराधना केली. त्यांच्या उत्कट तपश्चर्येने गणपती प्रसन्न झाले. त्यांनी दशभुजा स्वरूपात त्यांना दर्शन दिले. त्या दोघांनी त्याची मनोभावे स्तुती केली आणि मंदार व शमीका यांना वृक्ष योनीतून मुक्त करण्याची विनंती केली. गणपती म्हणाले, “भृशुंडी हा माझा श्रेष्ठ भक्त आहे. तो महातपस्वी आहे. त्याचे वचन मोडणे विधीला ही शक्य नाही, पण आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी मी नित्य वास्तव्य करीन असे वचन देतो. त्यामुळे तो त्रिखंडात पूज्य व पवित्र होईल. जो कोणी मंदार वृक्षाच्या खाली माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करील, दुर्वा आणि शमीपत्राने माझी पूजा करील, त्याच्या सर्व इष्ट कामना मी पूर्ण करीन. तेव्हापासून शमीपत्र गणपतीला अतिप्रिय झाली.
*ब्रह्मदेवांचा यज्ञ सावित्रीचा देवांना शाप*
फार पूर्वी सह्याद्री पर्वतात शंकराचा निवास होता. तेच स्थान महाबल क्षेत्र म्हणून प्रख्यात झाले. ब्रह्मदेवाने तेथे यज्ञ करण्याचे ठरविले. गायत्री व सावित्री आपल्या दोन भार्यासह ब्रह्मदेव तेथे आले. त्यांनी यज्ञाची सिद्धता केली. यज्ञ आरंभाच्या समयी सावित्री गृहकार्यात मग्न होती, म्हणून त्यांनी गायत्रीला बरोबर घेऊन यज्ञ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सावित्रीला फारच संताप आला. ती तावातावाने यज्ञ मंडपात आली व तेथील उपस्थितांना उद्देशून म्हणाली, “या मंगलप्रसंगी तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले. माझी येण्याची वाटही न पाहता यज्ञ आरंभ केला. हा माझा अपमान आहे. या प्रमादाचे फळं तुम्हाला भोगावेच लागेल. हा यज्ञ सिद्धीस जाणार नाही. तुम्ही सगळे जल व्हाल.”
सावित्रीची शापवाणी ऐकून निमंत्रित देव आणि अन्य मान्यवर भयभीत झाले. शापाचे संभावित परिणाम लक्ष्यात घेऊन देवांनी सह्याद्री पर्वतात उगम पावलेल्या नद्यांची रूपे घेतली. त्या समयी शिवपत्नी पार्वती, विष्णुपत्नी लक्ष्मी, सूर्यपत्नी छाया, इंद्रपत्नी इंद्राणी आदि देवस्त्रियांनी ब्रह्मदेवांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, “हे विधाता, तुम्ही सावित्रीचा मान ठेवला नाही. यज्ञआरंभी विघ्नहर्त्या गणेशाचे पूजन केले नाही. त्यामुळे पुढील अनर्थ घडला. आमच्या पतींना जलरूप प्राप्त झाले. आता या संकटाचे निवारणही तुम्हीच करा.”
ब्रह्मदेवाने देवस्त्रियांची कशीबशी समजूत काढली. त्यांना घेऊन ते कर्नाटकात गेले. तेथे एका पवित्र स्थानी असलेल्या मंदार वृक्षाखाली श्रीरामाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली होती. ब्रह्मदेवाने आणि देवस्त्रियांनी त्या मूर्तीची मनोभावे पूजा केली. गणेशाला शमीपत्र अर्पण केली. त्या सर्वांनी तेथेच राहून बराच काळ गणेश आराधना केली. प्रसन्न झालेल्या गणपतीने त्या सर्वांना चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिले. ब्रह्मदेवाने त्यांना आपले मनोगत सांगितले. गणपती म्हणाले, “हे विधी, सावित्री महासाध्वी आहे. तिचे शापवचन मी खोटे ठरवू शकत नाही. पण यापुढे नदीरूप झालेले देव अंशरूपाने नद्यांच्या आणि अंशरूपाने तरीही पूर्णस्वरूपात त्यांच्या स्त्रियांसमवेत राहतील, एवढी व्यवस्था मात्र करतो.” ते आशीर्वचन ऐकून देवस्त्रियांना फार आनंद झाला. शापग्रस्त देवही अंशरूपाने तेथे आले. त्यांनी गणपतीला वंदन केले. मग त्या सर्वांनी गणपतीची शमीपत्राने पूजा केली. त्या स्थानी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यास *हेरंब* हे नाव दिले. ब्रह्मदेवांनी तिथेच वास्तव्य करून बारा वर्ष तपश्चर्या केली. गजाननास प्रसन्न करून घेऊन त्यांनी यज्ञ समाप्ती केली. मग ते सत्यलोकी गेले.
श्री गणेश पुराण कथा (ड)*
*ढुंढिराज महात्म्य*
पूर्वी प्रियव्रत नामक एक राजा होऊन गेला. तो सत्यप्रिय, न्यायप्रिय व धर्मानुगामी होता. कीर्ती आणि प्रभा या त्याच्या भार्या. प्रभेपासून त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव पद्मनाभ. राजाचे प्रभा व पद्मनाभ यांच्यावर निरतिशय प्रेम होते. राजपुत्र वयात आल्यावर राजाने पांचाल देशाच्या राजकन्येशी त्याचा विवाह लावून दिला. राजाचा प्रभा राणीकडे जास्त ओढा असल्यामुळे सर्वत्र तिची सत्ता चाले. कीर्ती राणीच्या नशिबी मात्र कायम उपेक्षा आणि अवहेलना आली होती.
ती आपल्या मंदिरातच बराच वेळ रडत होती. मग तिने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचे ठरवले. योगायोगाने त्याच वेळी देवक नामक राजपुरोहित काही कामानिमित्त तिला भेटण्यासाठी आले. राणीची अवस्था पाहून त्यांना फार वाईट वाटले. ते म्हणाले, “हे राणी, तु आत्महत्या करू नकोस. तु गणपतीला अनन्य भावाने शरण जा, त्याचे प्रेमपूर्वक आराधना कर. तुझे कल्याण होईल!” पुरोहिताच्या उपदेशाने कीर्ती राणीचे मन शांत झाले. तिने मंदार वृक्षाच्या लाकडापासून तयार केलेली एक गणेशमूर्ती आपल्या देवघरात स्थापन केली. त्या मूर्तीला आपली व्यथा सांगितली. त्या मूर्तीची ती नेमाने पूजा, आराधना करू लागली.
ती गणपतीला दुर्वा अर्पण करीत असे. ज्येष्ठ मासातील एके दिवशी तिच्या दासीला कोठेही दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून तिने शमीपत्र आणली. राणीने ते शमीपत्र देवाला अर्पण केली व म्हणाली, “हे मंगलमूर्ती गजानना! दुर्वा उपलब्ध नसल्यामुळे मी अर्पण केलेल्या या शमीपत्रांचा तू स्वीकार कर. आजपासून पुढे जोपर्यंत दुर्वा मिळत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही.” त्या दिवशी संपूर्ण दिवस ती निराहारच राहिली. रात्र समयी गजाननाने तिला स्वप्नात दर्शन दिले. ते तिला म्हणाले, “शमीपत्रांनी पूजन केल्याने मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. तू राजाला प्रिय होशील. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.” त्या स्वप्नदृष्टांताने कीर्ती राणीचा आनंद गगनात मावेना. ती अधिक निष्ठेने गणेश आराधना करू लागली.
काही काळाने प्रभा राणीला कुष्ठरोग झाला. त्यामुळे तिला राजा टाळू लागला. तो कीर्तीच्या अधिक जवळ आला. तिच्याच सहवासात रमू लागला. अशाप्रकारे गजाननाच्या कृपेने तिला पतिसौख्य लाभले. मानसन्मान मिळू लागला. राजापासून तिला जो पुत्र झाला त्याचे नाव क्षिप्रप्रसादन ठेवण्यात आले. कीर्तीचे वाढते वैभव पाहून प्रभा दिवस-रात्र जळू लागली. आता तिचा मुलगाच आपल्या राज्याचा वारसदार होणार या विचाराने तिला रात्र रात्र झोप येईना. तिने कीर्तीच्या चार वर्षांच्या मुलावर दहीभातातून विषप्रयोग केला. तो तडफडून जागीच मरण पावला.
पुत्र निधनाने प्रियव्रत आणि कीर्तीला मोठा धक्का बसला. ती अनावर दुःखाने आक्रोश करू लागली. त्याच वेळी महान गणेशभक्त अशी त्रिखंडात ख्याती असलेले गृत्समद ऋषी तेथून कुठेतरी जात होते. त्यांनी कीर्ती राणीला पाहिले. तिची शोकग्रस्त अवस्था पाहून तेही गहिवरले. त्यांनी तिचे सांत्वन केले. मग ते म्हणाले, “हे राणी, धीर धर ! पूर्वी दुर्वा मिळाल्या नाहीत म्हणून तू शमीपत्रांनी गणपतीची पूजा केली होतीस, ते पुण्य तु या पुत्राला अर्पण कर. तो जिवंत होईल.” कीर्ती राणीला पूर्वीचा स्वप्नदृष्टांत आठवला. तिने गणपतीचे स्मरण केले. ऋषी वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून तिने शमीपत्र पूजनाचे पूण्यफल आपल्या पुत्राला संकल्पपूर्वक अर्पण केले. तर काय आश्चर्य! क्षिप्रप्रसादनाच्या निष्प्राण देहात पुनश्च प्राण संचार होऊन तो उठून बसला.
कीर्तीने गृस्त्मद ऋषींचे पाय धरले. ती गृस्तमदांना म्हणाली, “गणपतीला शमीपत्र अर्पण केल्याचे महात्मे किती थोर आहे, याचा मला आज प्रत्यय आला.” गृस्तमद म्हणाले, “शमीचे महात्म्य फार मोठे आहे. शमी या नावाचा नुसता उच्चार केल्याने मनुष्याच्या असंख्य पातकांचा नाश होतो.” कीर्ती राणी गृस्तमदांना म्हणाली, “महाराज माझा पुत्र लहान आहे. उपासनेच्या दृष्टीने त्याला सहज उच्चारता येईल असे एखादे गणेश नाम सांगण्याची कृपा करावी.” ऋषी म्हणाले, “गणपतीचे ‘गजानन’ हे नाव अतिशय सुलभ आहे. गणपतीच्या ढुंढि या नावाचेही महात्म्य फार थोर आहे. या संबंधित षडाननाने अगस्ती ऋषींना एक कथा सांगितली होती. तीच कथा मी तुला सांगतो, ती ऐक.
विधात्याच्या आज्ञेनुसार कश्यपाने चतुर्विध सृष्टी निर्माण केली. त्याच वेळी लोकांच्या उद्धारासाठी पवित्र तीर्थक्षेत्र निर्माण केली. मोक्षदायक सप्तपुरांमध्ये काशी क्षेत्राचे स्थान फार वरचे आहे. हे क्षेत्र भगवान शंकरांनी स्वेच्छेने निर्माण केले आहे. येथे मृत होणाऱ्यांना अन्य गती नाही. त्या सर्वांना विश्वेश्वर मोक्ष देतात.
दुरासद भस्मासुराचा पुत्र. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून *नमः शिवाय* या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेतला. त्या मंत्राचे एकांत स्थानी हजारो वर्षे अनुष्ठान केले. प्रसन्न झालेल्या शंकराने त्यास दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले. तो म्हणाला, “हे महादेवा, मला मानव, प्राणी तसेच देव-दानव, यक्ष राक्षस यांच्यापैकी कोणाकडूनही मृत्यू येऊ नये.” तेव्हा शंकर म्हणाले, “शक्तीशिवाय अन्य कोणीही तुला मारू शकणार नाही.” शिवाच्या वरदानाने दूरासद फारच उन्मत झाला. त्याने आपल्या सामर्थ्याने त्रैलोक्यावर सत्ता प्रस्थापित केली. दुरासदाने भस्मासुराच्या मुकुंदपुरासच आपली राजधानी केली आणि त्रीखंडावर निरंकुश सत्ता गाजवू लागला.
एके दिवशी दूरासद राज्यसभेत बसला होता. तो प्रधानांना म्हणाला, “मी स्वर्ग व पाताळासह नवखंड पृथ्वी जिंकली. पण दहावे खंड म्हणून प्रख्यात असलेली वाराणसी अजूनही माझ्या ताब्यात नाही.” प्रधानाला त्याचा हेतू कळला. त्याने दैत्यसेनेला युद्धसिद्धतेचे आदेश केले. दुरासदाने काशी वर आक्रमण केले. सर्व देवांनी भवानीची व गजाननाची स्तुती केली. दूरासदरुपी संकटातून सोडविण्याची त्या दोघांना आर्ततेने प्रार्थना केली. देवांनी सर्व वृत्तांत पार्वतीला कथन केला.
दुरासदाच्या अत्याचारांविषयी ऐकून ती महादेवी अतिशय संतप्त झाली. तिच्या डोळ्यातून आणि श्वासोच्छवासातून दिव्य तसेच भयंकर उग्र तेज बाहेर पडू लागले. त्या तेजाचे पूर्ण आविर्भवन झाले तेव्हा देवांना त्यामध्ये दोन दातांसह शुंडादंडाने युक्त अशी अत्यंत तेजस्वी गजमुख मूर्ती दिसून आली. देवांनी त्याची स्तुति केली. त्याला *वक्रतुंड* या नावाने संबोधले. वक्रतुंडा ने सर्व देवांना धीर दिला. हाती भयंकर शस्त्रास्त्रे घेऊन तो सिंहारूढ झाला.
त्याने दुरासदाला ललकारले, तेव्हा तोही शस्त्रसज्ज होऊन युद्धास ठाकला. मग सुरू झाले एकच भयंकर रणकंदन! वक्रतुंडाने आपल्या परशूने त्या महादैत्यावर तीव्र हल्ला चढविला. संतप्त झालेल्या दुरासदाने गणपतीला द्वंद युद्धाचे आव्हान दिले. दोघेही एकमेकांना भिडले. त्या मल्लयुद्धात गजाननाने दुरासदाच्या तोंडावर जोराने मुष्टीप्रहार केला. तो आघात असह्य होऊन तो मूर्च्छित पडला. तो भानावर आला तेव्हा सायंकाळ झाली होती. युद्ध थांबून दोघेही वीर आपापल्या शिबिरात परतले.
दुसरा दिवस उजाडला. दुरासदा आणि गणपती यांच्यात भीषण अस्त्रयुद्ध झाले. ‘शक्तीपासून उत्पन्न झालेला कोणी विरच तुला परास्त करील’ या शिव वचनांचे त्याला वारंवार स्मरण होऊ लागले. वक्रतुंड हा शक्तीचा पुत्र आहे, त्याच्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याच वेळी गजानन विराट रूप धारण करून त्याच्या सन्मुख प्रकट झाले. त्याने दुरासदाची शेंडी धरली. एक पाय काशीमध्ये आणि दुसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून मोठ्याने गर्जना करीत तो म्हणाला, “दुष्टा, भगवान शंकराच्या वरप्रसादाने तुला मृत्यू येणार नाही हे जरी खरे असले, तरी पर्वताच्या रूपाने तु या क्षेत्राजवळ पडून राहा. या स्थानाचे सदोदित रक्षण कर.”
तेव्हा गणपतीच्या पावन पदस्पर्शाने दुरासदाचा दैत्यभाव मावळला. तो विनम्र वाणीने म्हणाला, “हे गजानना, हे शक्तीसुता ! माझ्या मस्तकावर पाय ठेवून तू निरंतर असाच उभा राहणार असशील तर मी ही आनंदाने पर्वत रूपाने येथे पडून राहिल.” ही त्याची विनंती गणपतीने तात्काळ मान्य केली. दुरासदाने पर्वताचे रूप घेतले आणि गजाननाने त्यावर वास केला.
दुरासदाच्या उपद्रवापासून सुटका झाल्यामुळे त्रिखंड आनंदित झाले. देवांनी आणि ऋषी जणांनी गणपतीची अपार स्तुती केली. ते म्हणाले, “हे पार्वतीनंदना! हे देवादीदेव गणराया ! देव आपल्यापेक्षा वेगळा आहे असे समजून सर्व जण तुला बाहेर धुंडीत असतात म्हणून तू ढुंढिराज म्हणून ओळखला जाशील. तुझ्या दर्शनाने, पूजनाने व स्मरणाने भक्तांचे कल्याण होईल. त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतील.” त्यानंतर सर्व देवांनी आणि ऋषींनी मंदारपुष्पे आणि शमीपत्र अर्पण करून गजाननाची मनोभावे पूजा केली. त्याने लोककल्याणार्थ काशीमध्ये वास करावा अशी प्रार्थना केली. त्यांच्या विनंतीवरून ढुंढिविनायकाने आपल्या छपन्न विभूतींसह वाराणसीत वास्तव्य केले.
गृस्तमद ऋषी कीर्ती राणीला पुढे म्हणाले, “हे राणी ! तुझा पुत्र क्षिप्रप्रसादन याने उपासनेसाठी गणपतीचे ढुंढिराज हे नाव घ्यावे असे मला वाटते. हे नाम घेतल्याने त्याचे कल्याण होईल. तो ज्ञानी, सद्गुणी आणि पराक्रमी होईल.
*🔸प्रदोष.🔸*
*द्वादशी संपल्यावर जी रात्र येते त्याला प्रदोष म्हणतात... (दोन्ही पक्षा मध्ये)*
*प्रदोष चार प्रकारचे असतात...*
*१. सोम प्रदोष- सोमवारी येणारा प्रदोष...*
*२. भौम प्रदोष- मंगळवारी येणारा प्रदोष...*
*३. शनी प्रदोष- शनीवारी येणारा प्रदोष...*
*४. पक्ष प्रदोष- इतर वारी येणारा प्रदोष...*
*या सर्वांमध्ये पक्ष प्रदोष हा अधिक महत्त्वाचा आहे...*
*प्रदोष या शब्दाचा अर्थ पहाता प्र म्हणजे प्रकर्षण युक्त, अतिशय लक्षणीय, व दोष म्हणजे दुर्गुण, पाप होय... म्हणजेच ज्यावेळेस एखादा दोष किंवा पाप अतिशय प्रखर असते, त्यावेळेस त्याची गणना प्रदोषात होते. अशा वेळी तो दोष जाण्यासाठी तितकीच प्रभावी उपाय योजना करणे महत्त्वाचे असते.....*
*म्हणून त्यासाठी प्रदोष व्रत हा एक अतिशय खात्रीशीर उपाय आहे...*
*१. सोम प्रदोष- पारमार्थिक, अध्यात्मिक,आणि पार लौकिक श्रेय प्राप्त करण्यासाठी हे व्रत करतात.....*
*२. भौम प्रदोष- आर्थिक समस्या,ऐहिक स्थिती सुधारण्यासाठी हे व्रत करतात.....*
*३. शनी प्रदोष- संतती विषयक सर्व समस्या सुटण्यासाठी हे व्रत करतात.....*
*४. पक्ष प्रदोष- हा सर्व समावेशक आहे.हे व्रत केल्यामुळे मानवाच्या धनधान्य, पुत्रपोत्रादीं समस्या, अनेक ऐहिक कामना पूर्ण होतातच पण मुक्तीसाठी आवश्यक ती भक्ती, साधना, साक्षात्कार याही गोष्टी या व्रतमुळे साध्य होतात... शिवाय कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक इ.अनेक प्रकारची दुरीते या व्रत मुळे समूळ नष्ट होतातच पण विविध प्रकारच्या सिद्धी या मुळे प्राप्त होतात.....*
*प्रदोष व्रताचे महत्व व पद्धत सोदाहरण वेदतुल्य श्री गुरु चरित्र या महान ग्रंथात दिलेले आहे... श्रद्धा, भक्तिभाव, नियमितता यामुळे अमूल्य असे फळ या व्रताने मिळते. केलेली सेवा निष्ठा वाया जात नाही .फक्त श्रध्देबरोबर सबुरी हवी...*
*॥ श्री गणेशाय नम: ॥*
गृत्समद ऋषींनी कीर्ती राणीला गणपतीच्या अनेक कथा सांगितल्या. तिला कल्याणप्रद अशिर्वाद देऊन ते निघून गेले. मग ती पुत्रासह काशीक्षेत्री गेली. तिथे ढुंढीराजाचे दर्शन घेतले. त्या विनायकाची दूर्वा आणि शमीपत्रांनी पूजा केली. आपल्या पुत्राला त्यांच्या चरणावर घातले. त्यांची भक्तीभावाने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतीने सगुण-साकार रूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले. त्यानंतर तिच्या पुत्राला परशु देऊन त्याला परशुबाहू या नावाने संबोधिले. गणपतीने आपला परशु क्षिप्रप्रसादनाच्या हाती दिला आणि तो अंतर्धान पावला. कीर्ती राणी स्वस्थानी परतली. त्या दोघांचे लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. क्षिप्रप्रसादनाने राज्याची धुरा समर्थपणे हाताळली. त्यानंतर त्याने आपल्या सद्गुणांनी सर्वांची मने जिंकून न्याय, नीती, धर्माने सहस्त्र वर्षे उत्तम राज्य कारभार करून तो अंती गणेशलोकी निघून गेला.
*नरांतकाचा वध*
आपल्या अनेक बलाढ्य दैत्यांच्या महोत्कटाने वध केला म्हणून नरांतक अक्षरश: जळतफळत होता. त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे ठरविले. शूर आणि चपल या दोन सहकाऱ्यांना कामगिरीवर पाठवले. महोत्कट शुक्ल ब्राह्मणाकडून प्रासादाकडे जात असताना त्यांनी पालखीवर हल्ला केला. तेव्हा महोत्कटाने दैत्यांना चांगलेच बदडून काढले. त्या दोघांना आपटून ठार मारण्याचे ठरविले. शूर आणि चपल रडत तेथून पळून गेले. त्यांनी नरांतकापाशी जाऊन सर्व वृत्तांत कथन केला. त्यांची अवस्था पाहून दैत्यराज बिथरला.
महोत्कट आणि काशीराजा यांचा सूड उगवायचा असा निश्चय करून त्याने त्वरेने आदेश दिले. महाबलाढ्य सेना घेऊन तो काशीवर चाल करून गेला. नरांतकाने काशी नगराला वेढा घातला हे वृत्त कळताच राजाने हे युद्धसिद्धता केली. आपल्या सेनापतीला व सैनिकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले. संरक्षक व्यूहरचना केली. त्यानंतर त्याने गणपतीची पूजा केली. महोत्कट आपला पाठिराखा आहे, असल्या हजारो संकटाचा नाश करील अशी त्याची पूर्ण श्रद्धा होती. शत्रूचा निःपात करण्यासाठी तो घोड्यावर स्वार होऊन निघाला.
नरांतकाच्या सैन्याने तटबंदीवर प्रखर हल्ला चढविला. आता युद्ध करण्याशिवाय पर्याय नव्हता. राजाने तातडीने प्रतिकाराचे आदेश दिले. काशीच्या सैनिकांनी दैत्यसैन्यावर त्वेषाने हल्ला केला. उभयपक्षी युद्धाला तोंड लागले. भयंकर रणधुमाळी माजली. राजाला भान राहिले नाही. शत्रूचा प्रतिकार मोडीत तो आत घुसला. याच संधीचा फायदा घेऊन दैत्यवीरांनी त्याला चहूकडून घेरले आणि शस्त्र ठेवण्यास भाग पाडले. त्यांनी काशीराजाला कैद करून नरांतकाच्या समोर उभे केले.दैत्यराजाने काशीराजाला आपल्या रथात घातले आणि नगराकडे निघाला.
नरांतकाने काशीराजाला धरून नेले या वृत्ताने संपूर्ण नगरीत एकच हाहाकार माजला. लोक चिंताग्रस्त होऊन आक्रोश करू लागले. त्या आणीबाणीच्या प्रसंगी महोत्कटाने राणीची त्वरित भेट घेतली. तिला धीर दिला. तिचे सांत्वन करून तो त्वरेने प्रासादाबाहेर आला. प्रांगणामध्ये येऊन त्याने प्रचंड गर्जना केली आणि आपल्या सिद्दींच्या सामर्थ्याने अफाट सैन्य उत्पन्न केले. मग एक अक्राळविक्राळ कालपुरुष निर्माण केला. त्याला त्या सेनेचे अधिपत्य करावयास सांगितले. कालपुरूष महाभयंकर गर्जना करीत प्रचंड सैन्यानिशी नरांतकावर चाल करून गेला. त्याने राक्षसांचे समूहाच्या समूह तोंडात टाकले, त्यांना दाढेखाली रगडून गिळून टाकले.
त्यानंतर नरांतकाची मानगूट धरली आणि त्याला फरफटत महोत्कटासमोर आणून टाकला. महोत्कटाने आपला जबडा उघडला, त्यामार्गे कालपुरुष सूक्ष्मरूपाने त्याच्या उदरात प्रवेशला. कालपुरुषाने दैत्यसेनेचा ग्रास केला, तेव्हा काशीराजालाही गिळून टाकले होते. त्याने महोत्कटाच्या उदरात प्रवेश केल्यावर काशीराजाही तेथे गेला. राजाला तेथे अनंत ब्रम्हांडे दिसू लागली. हा काय प्रकार आहे हे त्याला समजेना. महोत्कटाला काशीराजा कुठेच दिसला नाही. त्याने आंतरदृष्टीने त्याचा सर्वत्र शोध घेतला. तो आपल्या शरीरात आहे हे त्याच्या तत्काळ लक्षात आले. मग त्याला विनायकाच्या रोमरंध्रातून बाहेर काढले. हे स्वप्न आहे की सत्य हेच राजाला कळेना. त्याने महोत्कटाला दुरूनच नमस्कार केला. मग तो राणीच्या मंदिरात प्रवेशला. आपल्या पतीला सुखरूप परत आलेला पाहून तिचा आनंद गगनात मावेना.
नरांतक फारच आश्चर्यचकित झाला. त्याने प्रचंड गर्जना करून महोत्कटावर चढाई केली. महोत्कटाने धनुष्य हाती घेतले. भात्यातील एक तीक्ष्ण बाणावर भयंकर दाहक अस्त्राची योजना करून त्याने अचूक शरसंधान केले. त्या बाणाने नरांतकाचे दोन्ही हात छेदले. महोत्कटाने तीव्र गतीने अभिमंत्रित बाण सोडून त्याचे दोन्ही पाय व मस्तक छेदले. त्यानंतर महोत्कटाने एकदम विराटरूप धारण केले आणि त्या दुष्टाला अंगठ्याने चिरडून टाकले. नरांतकाचा अंत झाला! त्रिभुवनावरचे मोठे संकट टळले. सृष्टीने नि:श्वास टाकला. देवांनी महोत्कटावर आनंदाने पुष्पवृष्टी केली.
श्री गणेश पुराण कथा (ब)*
*देवांतकाचा वध*
नरांतकाच्या निधनामुळे देवांतकाला फार दुःख झाले. तेव्हा राक्षसांचा संहारास कश्यपपुत्र महोत्कटच जबाबदार आहे, हे त्याच्या लक्षात आले. तो संतापाने बेभान झाला. ‘जोपर्यंत महोत्कटाचा वध करीत नाही, तोपर्यंत नरांतकाची उत्तरक्रिया करणार नाही’ अशी भीषण प्रतिज्ञा करून त्याने आपल्या सैन्यासह आकाशात उड्डाण केले. त्याने त्वरेने काशी गाठली. हे वृत्त समजताच काशीराजा फारच भयभीत झाला. तो त्वरेने अंगणात खेळणाऱ्या महोत्कटापाशी गेला. काशीराजाची विनंती ऐकुन महोत्कटाने त्याला अभय दिले.
दुसऱ्या क्षणी त्या लिलाविग्रही अवतारी गणेशाने आपले बालरूप टाकून सिंहारूढ असे अतिविशाल रौद्ररूप धारण केले. त्याने सिद्धी-बुद्धीला सर्व सामर्थ्यानिशी प्रकट होण्यास सांगितले. त्याबरोबर अणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या वशित्व आणि ईशीत्व या अष्टमहासिद्धी त्याच्या अंगात प्रविष्ट झाल्या. महापराक्रमी सेनाही प्रकट झाली. त्या सेनेसह महोत्कटाने देवांतकाच्या सैन्यावर चढाई केली. तेव्हा देवांतकाने दैत्य गुरु शुक्राचार्य ची मदत घेतली. महोत्कटाने सिद्धयोगाने एक महाभयंकर कृत्या उत्पन्न केली. तिने देवांतकाच्या सैन्यात घुसून प्रचंड उत्पात घडविला आणि शुक्राचार्यांना दूर बर्बर देशात भिरकावले.
हे युद्ध तीन दिवस रात्र अखंड चालले होते. देवांतकाने निर्णायक युद्ध करण्याचा निश्चय केला. त्याने महोत्कटाच्या सैन्याच्या व्यूहरचना फोडून प्रचंड कत्तल केली. हा सर्व प्रकार पाहून बुद्धी महोत्कटास म्हणाली, “हे प्रभू, आता मला अनुज्ञा द्या.” विनायकाची संमती मिळताच बुद्धीने राक्षसांकडे पाहून आव्हानात्मक प्रचंड गर्जना केली. तिला रोखण्यासाठी देवांतकाने शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. देवांतकाने संधी साधून तेथून पळ काढला. तो कसाबसा पित्याच्या घरी आला. त्याने रौद्रकेतुला आपल्या पराभवाचे वृत्त सांगितले. त्याने देवांतकाला धीर दिला आणि युद्धात यशस्वी होण्यासाठी शिव अनुष्ठान करण्यास सांगितले.
शिवमहामंत्राचा उच्चार करून ते दोघे प्रदीप्त अग्नीमध्ये हविर्द्रव्यांनी विधिवत हवन करु लागले. होमविधी संपन्न झाल्यावर रौद्रकेतूने देवांतकाला बळी दिले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला पुन्हा जिवंत केले. महादेवाच्या वरदानाने देवांतकाने प्रचंड गर्जना करून महोत्कटास युद्धाचे आव्हान दिले. तोही तयारीतच होता. बघता बघता दोन्हीकडचे वीर परस्परांवर धावून गेले. तुंबळ रणकंदन माजले. महोत्कटाने प्रलयकारी मेघाच्या गडगडाटाप्रमाणे प्रचंड गर्जना केली. तो देवांतकास म्हणाला, “मुढा, तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझा मृत्यू निश्चित आहे.”
देवांतकानेही त्याला प्रतिआव्हाने दिली. मग ते दोघे एकमेकांवर तुटून पडले. तो सर्व प्रकार पाहून चवताळलेल्या देवांतकाने महोत्कटावर प्रचंड शरवर्षाव केला. त्यातून काहीच साध्य झाले नाही. शंकराच्या वरदानानुसार देवांतकाचा वध दिवसा किंवा रात्री करता येणे शक्य नाही, त्यासाठी संधीकालच उपयुक्त आहे हे महोत्कटाच्या लक्षात आले. महोत्कटाने दुसऱ्या दिवशी पहाटेच युद्धात जाण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास विनायकाने सैन्यावर अचानक हल्ला केला. त्या वीरांना धराशायी करित तो देवांतकच्या शिबिरात प्रवेशला.
त्याने अर्धवट झोपेत असलेल्या त्या दुष्ट दैत्याला आपल्या मांडीवर घेतले. त्याही परिस्थितीत देवांतकाने जोरदार प्रतिकार केला. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने विनायकाच्या एका दाताला जोराने धक्का दिला. तो दात अर्धवट तुटून खाली पडला. त्याबरोबर तो दैत्यही खाली आदळला. संतापलेल्या महोत्कटाने कसलाही विचार न करता त्या तीक्ष्ण दाताने शतप्रहार करून त्याचे मस्तक विदीर्ण केले. देवांतकाचा वध झाला. त्याची प्राणज्योत महोत्कटाच्या शरीरात विलीन झाली. देवांतकाचे आतंक संपले होते.
महोत्कटाच्या या विजयाने त्रिभुवनात आनंदाला उधाण आले. सर्वत्र त्याचा जयजयकार दुमदुमला. त्यास *उपेंद्र* या नावाने सन्मानित केले. पृथ्वीवरील राजांनी *ऋषिकेश* या संबोधनाने त्यांची अपार स्तुती केली. आपल्या नगरी वरचे महान संकट टळले म्हणून काशीराजाचा जीव भांड्यात पडला. तो तत्परतेने महोत्कटाच्या भेटीस आला. काशीराजाने त्याला वाजत-गाजत मिरवणुकीने नगरात आणले. नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
राजाच्या ज्योतिषांनी शुभमुहूर्त काढला. निमंत्रणे पाठवण्यात आली. महोत्कटाने नरांतक-देवांतक यांच्यासह असंख्य दुष्ट दैत्यांना मारून जगावर उपकार केले होते, त्यामुळे विवाहप्रसंगी त्याचेही दर्शन होईल या उद्देशाने सर्व मंडळी बहुसंख्येने आली होती. राजपुत्राचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. काशीराजाने निमंत्रितांचा सत्कार केला. सर्व कार्य पूर्ण झाल्यावर राजाने महोत्कटाच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले. त्याला दिव्य वस्त्रअलंकार देऊन गौरविले. द्रव्य दिले.
राजाने त्याला स्वर्ण रथातून कश्यप यांच्या आश्रमात नेण्याचे ठरविले. त्याला निरोप देण्यासाठी काशीतील सर्व मान्यवर नगरवेशीपर्यंत आले होते. महोत्कटाला घेऊन काशीराजा कश्यप यांच्या आश्रमात गेला. कश्यप आणि आदितीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर बराच कालावधी लोटला. महोत्कटाने आपल्या मातापित्याकडे जाण्याची अनुज्ञा मागितली. त्याचे मनोगत जाणून कश्यप आणि आदितीला फारच दुःख झाले. त्याला थांबवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. त्यांना वंदन करून महोत्कट अंतर्धान पावला. कश्यपांनी त्या ठिकाणी विनायकाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून एक सुंदर मंदिर बांधले. नंतरच्या काळात विनायकाने आपल्या मातापित्यांना अनेकदा दर्शन देऊन त्यांचे समाधान केले.
बुधवार दि. 27 ऑगस्ट ते मंगळवार दि. 2 सप्टेंबर 2025 पर्यंत
ऋतं वदामि सत्यं वदामि
ज्योतिष आणि कर्मकांड हे आपल्या इथे बेमालूम मिसळलेले आहेत की, त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात बघणेही आपल्याला मान्य नाही! मुळात काही विद्वानांचे म्हणणेच असे आहे की, होम-हवन यासारख्या कर्मकांडाकरता मुहूर्त काढण्याकरता ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली (जे अर्धसत्य आहे). असो. सनातन हिंदू धर्मात अनेक उपासना पंथ आहेत आणि त्यातील एक अत्यंत प्राचीन व प्रभावी पंथ म्हणजे गाणपत्य पंथ. इथे हे ही लक्षात ठेवले पाहिजे की, गणपतीला ‘विघ्नहर्ता’ म्हणून देखील संबोधिले आहे. या पंथात गणपतीला केवळ विघ्नहर्ता किंवा बुद्धीचा देव मानले जात नाही, तर तो परब्रह्म, सर्वश्रेष्ठ देवता आणि सृष्टिकर्ता म्हणून पूजला जातो. या लेखामध्ये आपण गाणपत्य पंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्त्वज्ञान, उपासना पद्धती, वर्तणूकशैली आणि आधुनिक काळातील महत्त्व यांचा सविस्तर अभ्यास करू.
- गाणपत्यपंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी : गणेश उपासनेचा इतिहास वैदिक काळापासून आहे. ऋग्वेद, यजुर्वेद व अथर्ववेद यामध्ये गणपतीचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लेख सापडतात. गाणपत्य पंथाची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या सहा शतकात झाल्याचा अंदाज आहे. पुढे शंकराचार्यांनी शण्मत: पंथांची रचना केली, त्यात गाणपत्य पंथाचाही समावेश होता. यामुळे या पंथाला शास्त्रशुद्ध अधिष्ठान मिळाले. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि दक्षिण भारतात या पंथाचा प्रभाव विशेषत: दिसतो.
- गणेश- परब्रह्मस्वरूप : गाणपत्य पंथानुसार गणेश म्हणजे सगुण ब्रह्माचा मूर्तरूप आहे. तो सर्व तत्त्वांचा अधिष्ठाता आहे. त्याच्या रूपातील विविध प्रतीकांना दैवी अर्थ आहे. मोठे डोके – ज्ञान व विवेक, मोठे कान – ऐकण्याची व समजून घेण्याची क्षमता, सोंड – लवचिकता व अडथळे पार करण्याची क्षमता, उंदरावर स्वार – इच्छाशक्तीवर नियंत्रण. गणेश हा भक्ताला केवळ भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक लाभ देणारा देव आहे.
- तत्त्वज्ञानवआध्यात्मिक दृष्टिकोन : गाणपत्य पंथानुसार ब्रह्म हे एकच आहे व ते गणेशरूप आहे. या पंथात अद्वैतवादाची छाया असून, ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोगाचा समन्वय आहे. गणेश हा सगुण ब्रह्म असून त्याच्यातून निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होते, असा दृष्टिकोन आहे. गाणपत्य संप्रदायामध्ये ज्ञानाची प्राप्ती ही ध्यान, जप, पूजा व उपासना यामार्फत होते. यामध्ये मूलमंत्र, बीजमंत्र, यंत्र व होमविधी यांचे विशेष स्थान आहे.
- प्रमुखग्रंथ- गणपती अथर्वशीर्ष : गाणपत्य संप्रदायातील सर्वात पवित्र ग्रंथ. यात गणेशाच्या ब्रह्मस्वरूपाचे वर्णन आहे. “त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं ऊद्र:” असे मंत्र यात आहेत. मुद्गल पुराण – गणेशाच्या आठ स्वरूपांचा उल्लेख. (वक्रतुंड, एकदंत, महोदर) गणेश पुराण – अत्यंत विस्तृत ग्रंथ. यात गणेशाच्या विविध लीलांच्या कथा आहेत.
- गणपतीउपासनाव साधना : गाणपत्य पंथात उपासना तांत्रिक पद्धतीने केली जाते. मंत्रजप, यंत्रपूजन, होम व विशेष गणेश यज्ञ केले जातात. काही उपासक एकाक्षरी मंत्र ‘गं’, तर काही “ॐ गं गणपतये नम:” या मंत्राचा जप करतात. गणेश यंत्र – विशेषत: गाणपत्य साधक यंत्र ध्यानासाठी वापरतात. गणहोम – नित्य हवन, गणपती अथर्वशीर्ष पठण याला महत्त्व आहे. व्रते – गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थीला उपासना विशेष महत्त्वाची.
- गाणपत्यसंप्रदायातीलसंत व गुरु परंपरा : या पंथात गुरुशिष्य परंपरा आहे. महागणपती उपासक, तांत्रिक गुरु, तसेच सिद्ध पुरुष वेगवेगळ्या काळात कार्यरत होते. काही प्राचीन गाणपत्य मठ आजही महाराष्ट्रात कार्यरत आहेत.
- प्रमुखगाणपत्यपीठे : गुजरात – मयूरगिरी मठ, एक प्रमुख गाणपत्य मठ, अष्टविनायक मंदिरे. महाराष्ट्र – मोरगाव, सिद्धटेक, पाळे. गणेश मंदिरांचा समूह, कणिपक्कम गणेश मंदिर. आंध्र प्रदेश – स्वयंभू गणेशमूर्ती, टोक गणपती. तामिळनाडू -तांत्रिक गणेश उपासनेचे प्रमुख केंद्र.
- आधुनिककाळातीलगाणपत्य पंथ : आजही गाणपत्य पंथ भारतात अस्तित्वात आहे, विशेषत: महाराष्ट्रात. गणेश चतुर्थीला सामाजिक व धार्मिक स्तरावर विशेष पूजन केले जाते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून गाणपत्य उपासनेला जनआंदोलनाचे रूप दिले. यासोबतच, अनेक तांत्रिक साधक आजही गणपतीच्या विविध स्वरूपांची उपासना करून सिद्धी प्राप्त करतात, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग साधतात. गाणपत्य पंथ हा केवळ एक उपासना पंथ नाही, तर एक जीवनमार्ग आहे. या पंथाच्या माध्यमातून भक्ताला केवळ भौतिक सुखच नाही, तर ब्रह्मज्ञान, मुक्ती व आत्मसाक्षात्काराचा मार्ग मिळतो. गणेश म्हणजे सर्व तत्त्वांचे संपूर्ण रूप. त्याचे स्मरण हेच सिद्धी व बुद्धीचे रहस्य आहे.

>> आशुतोष बापट
गणेशाची देवस्थाने पाहताना आडेवाटेच्या दैवतांना जरूर भेट द्यावी. सह्याद्रीच्या डोंगरांचे सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण असलेल्या कोल्हापूर जिह्यातील इच्छापूर्ती गणेश आणि इंचनालचा गणेश ही वेगळेपण दर्शवणारी गणेशस्थाने, ज्यांचे दर्शन घ्यायलाच हवे.
महाराष्ट्राच्या दक्षिणेचा जिल्हा कोल्हापूर आणि त्या कोल्हापूरच्याही दक्षिणेला असलेले तालुके म्हणजे गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा. या तीनही तालुक्यांना निसर्गाने भरभरून दिलेले आहे. सह्याद्रीच्या डोंगरांचे सान्निध्य, रमणीय वनसंपदा आणि निसर्गाची उधळण असे सगळे यथास्थित प्रकरण आहे. या ठिकाणी आडवाटेवर फिरताना दोन सुंदर गणेशस्थाने बघावीत अशी आहेत. त्यांचे स्थान, त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा आणि त्या ठिकाणाचे नैसर्गिक महत्त्व यासाठी ही दोन ठिकाणे मुद्दाम वाट वाकडी करून बघावीत.
इच्छापूर्ती गणेश- एरंडोल आजरा
कोल्हापूर जिह्यातला आजरा तालुका निसर्गसौंदर्याने नटलेला आणि बहरलेला आहे.
हा सगळा प्रदेश खरं तर दुर्गम म्हणायला हवा. अतिशय रमणीय आणि गूढ असलेल्या
ह्या आडवाटेवरच्या प्रदेशात एक गणेशस्थान आहे एरंडोल इथे. हे
गणेशस्थानसुद्धा काहीसे गूढ म्हणावे लागेल. ही मूर्ती एरंडोल आजरा इथे
पोखरकर महाराजांच्या आश्रमात असलेल्या अष्टकोनी मंदिरामध्ये स्थापित केलेली
आहे. आश्रमात एक विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आणि जाबाली ऋषींची समाधीसुद्धा
आहे. भक्तांनी केलेल्या आर्थिक मदतीमधून हे मंदिर बांधलेले आहे. या
मंदिराला तळघर असून ध्यानधारणेसाठी तिथे बसता येते. अष्टविनायकांच्या
प्रतिमा आठ दिशांना या मंदिरात ठेवलेल्या आढळतात. गर्भगृहात सोळा हात
असलेली, उजव्या सोंडेची, पंचधातूची ही मूर्ती उभ्या स्थितीतली आहे.
मूर्तीचे सोवळे अत्यंत कडक असून पुजारी सोडून कोणालाही गर्भगृहात प्रवेश
करता येत नाही. ही मूर्ती इथे कशी आली याबद्दल एक चमत्कारिक कथा प्रसिद्ध
आहे. तांत्रिक साधना करणाऱया लोकांच्या वापरातली ही मूर्ती होती. चंबळ
इथल्या एका ऋषींच्या जवळ असलेली ही मूर्ती चंबळ-उज्जैन-तंजावर-गोकाक असा
प्रवास करत शेवटी संकेश्वर इथल्या रघुनाथशास्त्राr नामक महात्म्याकडे आली.
रघुनाथ शास्त्राr आजारी पडल्यावर ही मूर्ती एरंडोल आजरा इथले संत तुळशीराम
महाराज पोखरकर यांना द्यावी असा त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. त्यायोगे ही
मूर्ती एरंडोल इथे येऊन पोहोचली. मूर्तीचे तेज आणि तिची शक्ती सहन न
झाल्याने तिचा सुरुवातीला पोखरकर महाराजांना बराच त्रास झाला. परंतु
त्यांचे गुरु काशी येथील आत्मप्रकाशानंद यांनी स्वामींना आश्वस्त केले आणि
त्याचा त्रास बंद झाला. पुढे पोखरकर महाराजांच्या आश्रमातच हे मंदिर बांधून
तिथे मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी प्रसाद म्हणून नारळ फोडला जात नाही तर
गूळखोबरे आणि शेंगदाण्याचे लाडू देवापुढे ठेवले जातात. अनेक भाविकांची
इच्छा पूर्ण करणारा म्हणून याला इच्छापूर्ती गणेश म्हणतात, तर साधकांना मदत
करणारा म्हणून याला मोक्षदाता गणेश असेही नाव आहे. दर संकष्टीला कर्नाटक,
गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातले अनेक भाविक दर्शनासाठी इथे येतात.
इंचनालचा गणेश
कोल्हापूर जिह्यातला गडहिंग्लज हा तालुका म्हणजे अनेक निसर्गरम्य ठिकाणे,
किल्ले, मंदिरे यांची रेलचेल असलेला प्रदेश आहे. खरं तर हा काहीसा
दुर्लक्षित भाग म्हणावा लागेल. पर्यटनाच्या दृष्टीने खूप समृद्ध असूनही या
प्रदेशांबद्दल फारशी माहिती लोकांना नसते. भौगोलिकदृष्टय़ा सुद्धा हा प्रदेश
काहीसा वेगळा पडल्यासारखाच आहे. आंबोलीसारखे प्रसिद्ध गिरीस्थान इथून जवळ
आहे. गर्द झाडी, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि चंदगड, आजरा यासारखे
निसर्गसंपन्न तालुके यांचा शेजार लाभलेला हा भाग. गडहिंग्लजच्या पश्चिमेला
फक्त 7 कि.मी. अंतरावर इंचनाल नावाचे टुमदार गाव आहे. निसर्गाचे सान्निध्य
लाभलेल्या या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर या
ठिकाणी गणेशाचे एक सुंदर मंदिर उभे आहे. या मंदिराला बराच इतिहास लाभलेला
आहे. इ.स. 1907-08 साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार श्री. गोपाळ
आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ
सेवा मंडळ, इंचनाळ, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून 1987 ते 1992
या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले. त्यासाठी गोकाकवरून
आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते 4
मे 1992 रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप,
बाजूला बगिचा, महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे हा. इंचनालच्या या
मंदिरातील गणेशमूर्ती बैठी असून तिची उंची अंदाजे सवा दोन फूट एवढी आहे.
काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते. चतुर्भुज
गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे. या
मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावानी जवळ जवळ 9 एकर
बागायती जमीन आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱया गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव
करतात आणि महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा,
बेळगाव इथून भाविक यावेळी इथे दर्शनाला येतात. अत्यंत जागृत आणि नवसाला
पावणारे अशी ख्याती असलेले हे देवस्थान आहे. महागावचे दंडगे (जोशी)
घराण्याकडे गेल्या 300 वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली
आहे. कोल्हापूर-गडहिंग्लज येण्यासाठी बस सेवा विपुल आहे. मुद्दाम वाट वाकडी
करून पर्यटकांनी हा सगळाच परिसर फिरून पाहण्याजोगा आहे.
ashutosh.treks@gmail.com
(लेखक }ाsकसंस्वॅढतीचे अभ्यासक आहेत)
वाई परिसरातील गाणपत्य संप्रदाय
भारतीय जनमानसातील लोकप्रिय दैवत म्हणजे गणपती होय. यादवांच्या काळात अंबाजोगाई येथे चौकामध्ये गणपतीचे भव्य मंदिर असल्याचा शिलालेखीय पुरावा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे यादव काळात बांधल्या गेलेल्या बहुतेक सर्व मंदिरांच्या दरवाजाच्या ललाटबिंबांवर गणपतीची मूर्ती कोरलेली असते. गर्भगृहातील देवता कोणीही असली, तरी ललाटबिंबांवर गणपतीच दिसतो. त्यामुळेही या काळात गणपती ही देवता खूप लोकप्रिय झाली होती, हे दिसते.
साधारणपणे इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वीरगळ आढळतात. या वीरांच्या स्मारकशिळा असतात. शत्रूने केलेल्या हल्ल्यात गायी-गुरांचे किंवा गावाचे रक्षण करताना मृत्युमुखी पडलेल्या वीरांची ही स्मारके गावोगावी पाहायला मिळतात. या स्मारकांवर तो वीर कसा धारातीर्थी पडला, हे सांगणारा जणू काही चित्रपटच असतो. एकावर एक असे अनेक प्रसंग दाखवणारे शिल्पपट असतात. त्यामध्ये वीराच्या मृत्यूचे कारण आणि त्यानंतर त्याचे अप्सरांबरोबर स्वर्गात सहगमन; तसेच नंतर त्याचे आराध्य दैवत म्हणजे शिव (लिंग या स्वरूपात) याची पत्नीसह आणि काही वेळेस गुरूसह पूजा सुरू आहे, असे दाखवलेले असते. अशा प्रकारचे शिल्पकाम असलेले हजारो वीरगळ आपल्याला भारतभर पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील अशा स्मारकशिळांवर क्वचित शिलालेख सापडतात. लेख नसेल, तरी तो वीरगळ पाहणाऱ्या व्यक्तीला महत्त्वाचा संदेश मिळतो, की शूर सैनिकाला वीर मरण आल्यास त्याला मृत्युनंतर स्वर्गप्राप्ती होते. सर्वसाधारणपणे या सर्वांचे आराध्य दैवत शिव होते, असे या शिल्पांमधून लक्षात येते. या शिल्पांमधील देवता बदलते, तेव्हा मात्र त्यांचा देव शिवापेक्षा कोणी तरी वेगळा होता, हे लक्षात येते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या आराध्य दैवताच्या ठिकाणी गणपती दिसतो. अशा प्रकारचे वीरगळ असणारी स्थाने फार थोडी आहेत; पण त्यापैकी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे वाईजवळील पांडे. पुण्यातील तरुण संशोधक प्रणव पाटील यांनी या गावाची माहिती दिली.
साताऱ्यापासून ३५ किलोमीटर आग्नेयेला वाई आहे. जीवनदात्री कृष्णा नदी ज्या गावातून वाहते, सातवाहन काळातील बौद्ध गुंफा अगदी जवळ असलेले आणि महाबळेश्वरच्या वाटेवरील हे छोटे निसर्गरम्य गाव विशाल गणपती व कृष्णाबाईच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. वाईपासून उत्तरेला चार किलोमीटर अंतरावर असलेले हे छोटेसे खेडे आहे. येथील अवशेषांवरून गावाची प्राचीनता काही प्रमाणात ठरवता येते. नदीच्या काठी असलेले काळभैरवाचे मंदिर, हे गावातले एक महत्वाचे देवस्थान. खरे तर ही गावाची वेसच आहे. या मंदिराच्या अंगणात काही वीरगळ ठेवलेले आढळतात. महत्त्वाचे म्हणजे, या ठिकाणी वीरगळावरील त्या वीराचा आराध्य देव गणपती आहे. असे वीरगळ खूप दुर्मीळ आहेत; पण ते जिथे जिथे आहेत, तिथे गाणपत्य संप्रदायाचे उपासक होते. पुण्यामध्येदेखील असे काही वीरगळ पाहायला मिळतात. यावरून ती व्यक्ती गाणपत्य संप्रदायातील होती, असे म्हणता येते.
असाच एक दुर्लक्षित पुरावा वाई या गावातून उजेडात आला आहे. तो म्हणजे, खुद्द वाईमध्ये ब्राह्मणशाही नावाच्या भागात असलेले ढुण्डिविनायक मंदिर. खरे तर वाई म्हटले, की विशाल गणपती; तसेच कृष्णेच्या घाटावरची इतर मंदिरे आठवतात. वाईमध्ये आलेले सगळे पर्यटक या मंदिरांना भेटी देतात. मेणवली, धोमेश्वर यांसारखी प्रसिद्ध ठिकाणेही पर्यटकांची गर्दी खेचतात; पण वाईमधील सर्वांत जुने, उभे असलेले मंदिर ढुण्डिविनायकाचे आहे. परंपरेने या मंदिराचा सांभाळ साबणे कुटुंबीय करीत आहेत. हे मंदिर कोणी बांधले, याची ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसली, तरी त्याचे स्थापत्य आणि नक्षीकाम, शिल्प आणि मंदिराशी असलेली परंपरा त्याचे प्राचीनत्व सुचवतात. वाईमधील परंपरेनुसार, जुन्या वाईतील लोकांची अक्षता देण्याची ही ग्रामदेवता आहे. आजही या मंदिराला अक्षतादेवता म्हणतात.
हे मंदिर नदीच्या काठावर, एका पीठावर बांधले आहे. त्यावर बाह्य भागावर काही शिल्प कोरली आहेत. त्यामध्ये हनुमान, काही योगी, पायामध्ये हत्ती पकडलेले वाघ अशी शिल्प आहेत. मंदिराच्या प्रवेशाद्वारावरील ललाटबिंबावर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरलेले आहे. त्या शिल्पाच्या खालच्या बाजूला गणपतीचेही शिल्प कोरलेले आहे. दाराच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरले आहे. मंदिराच्या मंडपात टेकून बसण्यासाठी कक्षासने आहेत. मंडपात दगडी स्तंभ आहेत. संपूर्ण बांधकाम मोठ्या दगडातच केले आहे. गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे. वाहन उंदीर मात्र त्याच्या समोर नसून, जरा बाजूला भिंतीपाशी आहे. मूळ मंदिरापेक्षा उशिराच्या काळातली नरसिंहाची मूर्तीही गाभाऱ्यात आहे आणि तशीच; पण जरा जुनी वाटणारी एक मूर्ती मंदिराच्या अंगणातील एका दगडी देवळीत ठेवली आहे. या मंदिराचे शिखर विटांचे असून, त्याची वेळोवेळी डागडुजी झाली आहे.
मंदिराच्या आवारात सहा संन्याशांच्या समाध्या आहेत. नावे माहीत नसली, तरी त्या संन्याशांच्या आहेत, हे लोकांना माहीत आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या भिंतीवर साधना करणाऱ्या योग्याचे शिल्प आहे; त्यामुळे या मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे लक्षात येते. या मंदिराच्या संबंधी एक मोडी कागद साबणे दप्तरामध्ये होता. तो डॉ. ग. ह. खरे यांनी वाचला होता. त्यांनी त्यावरून सांगितले होते, की या मंदिराला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षासन लावून दिले होते आणि ते आम्ही पुढे चालवत आहोत, असा छत्रपती शाहू महाराजांचा एक आदेश होता. त्यानंतर ब्रिटिश सरकारनेही तेच वर्षासन पुढे सुरू ठेवले, असेही कागद विश्वस्तांकडे आहेत; त्यामुळे या मंदिराचे बांधकाम शिवपूर्व काळातील आहे, हे स्पष्ट होते. वाईमधील इतर मंदिरांचे बांधकाम पेशवाईतील असल्यामुळे, त्यामधे हे सर्वांत प्राचीन ठरते. यादव काळ ते शिवकाल यामधल्या काळातील फारशी मंदिरे सापडत नाहीत; त्यामुळे या मंदिराचे महत्त्व अपरंपार आहे.
या काळात वाई परिसरात गणपती या देवतेची लोकप्रियता वाढत चालली होती आणि गाणपत्य संप्रदायाचे महत्त्व वाढले होते, हेदेखील या पुराव्यांवरून लक्षात येते. यानंतर पेशवाईमध्ये वाई येथे अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी सर्वांत प्राचीन मंदिरावरून आणि जवळच्या पांडे या गावातील वीरगळावरून इसवी सनाच्या तेराव्या-चौदाव्या शतकातील गाणपत्य संप्रदायाच्या लोकप्रियतेचे स्वरूप लक्षात येते.
गणेश चतुर्थी पर विशेष:देश का अनूठा शिल्प मंदिर मंदाकिनी: नारी गणेश की 2 मूर्तियां, महामारी से बचाव के लिए व...
गणेशी या नारी गणेश का नाम थोड़ा अटपटा लग सकता है, लेकिन भीलवाड़ा जिले के बिजौलियां में स्थित प्राचीन मंदाकिनी शिल्प मंदिर में नारी गणेश की दो अद्भुत मूर्तियां हैं। इस अनूठे मंदिर में गणेश चतुर्थी और अन्य विशेष अवसरों पर विनायकी मूर्तियों की पूजा की ज
.
नारी गणेश की मूर्तियों का अंकन 10वीं और 12वीं शताब्दी में हुआ माना जाता है। जबकि देशभर में कुछ ही मंदिरों में नारी गणेश की मूर्तियां हैं, बिजौलियां का मंदाकिनी मंदिर अपनी दो मूर्तियों के साथ एकमात्र है।

मंदाकिनी मंदिर के बाहरी स्तंभ पर नारी गणेश की एक छोटी प्रतिमा है, जबकि मंदिर के दक्षिण भाग के कोष्ठकों में नारी गणेश की ललितासन प्रतिमा उत्कीर्ण की गई है। इस चतुर्भुज प्रतिमा में शिल्पियों ने नारी गणेश को फरसा, गदा, मोदक और सुंड के साथ मोदक थाल पर अंकित किया है। इसे तांत्रिक प्रभाव के रूप में भी माना जाता है, और उन्नत वक्ष व अलंकरण नारी देह का परिचायक हैं। मंदाकिनी मंदिर पुरातत्व विभाग के अधीन है और इन विनायकी प्रतिमाओं के बारे में बहुत कम लोगों को जानकारी थी। करीब 15 साल पहले कस्बे वासियों को इन अनूठी मूर्तियों का पता चला और तब से पर्व, त्योहार, बुधवार और गणेश चतुर्थी पर श्रद्धालु इनकी पूजा-अर्चना करते हैं।
कौन है वैनायिकी नारी गणेश के कई नाम हैं, जैसे गणेशी, नारी गणेश, गजानना, हस्तिनी, वैनायिकी, विघ्नेश्वरी, गणेश्वरी, गणपति सदा, अयंगिनी, महोदरा, गजवस्त्रा, लंबोदरा, और महाकाया। ओडिशा के चौंसठ योगिनी मंदिरों और जबलपुर के भैरा घाट मंदिर में नारी गणेश की एक-एक मूर्ति है। राजस्थान के हर्ष देव मंदिर में भी नारी गणेश की मूर्ति स्थित है। बिजौलियां के मंदाकिनी मंदिर में नारी गणेश की दो अद्भुत मूर्तियां हैं।

इतिहासकार डॉ. श्री कृष्ण जुगनू ने बताया कि विनायिकी की पूजा के पीछे छः प्रकार की मान्यताएं रही हैं- महामारी, टिड्डियों, राजभय, चूहों, आदि। बेगूं, बिजौलिया सहित कई गांवों में आज भी किसान गणेशजी को बीज चढ़ाकर ही बुवाई करते हैं। यह मान्यता 12वीं सदी के आसपास की मानी जाती है, क्योंकि गणेशी की मूर्तियां इसी समय की हैं। यदि चूहे बीज खा जाते हैं तो स्त्री को बीज बचाने वाली और उर्वराशक्ति संपन्न माना जाता है। यही विश्वास इस देवी के प्रति श्रद्धा का कारण बना है।

1 हजार साल पुरानी हैं मूर्तियां
राष्ट्रपति से सम्मानित उदयपुर के प्रसिद्ध इतिहासकार डॉ. श्रीकृष्ण जुगनू के अनुसार, 10वीं और 12वीं शताब्दी के दौरान मेनाल एक महत्वपूर्ण मूर्ति धाम के रूप में प्रतिष्ठित था। इसी अवधि में बिजौलियां के मंदाकिनी मंदिर में नारी गणेश की मूर्तियां तराशी गईं। मेवाड़ में नारी गणेश की पूजा दैवीय शक्ति के रूप में की जाती रही है। विनायिकी को चौंसठ योगिनियों में शामिल किया गया है। मधुरा, आंध्रप्रदेश, लोहारी-बांदा, ग्वालियर, हिंगलाज गढ़ (मध्यप्रदेश), और राजस्थान के हर्ष देव तीर्थ जैसे स्थानों पर चौथी से लेकर सातवीं शताब्दी तक की विनायिकी की प्रतिमाएं प्राप्त हुई हैं।
डॉ. जुगनू बताते हैं कि इस देवी को देवताओं की सहयोगी माना गया है। नारी गणेश को फसलों को चूहों, टिड्डियों और कीटों से बचाने और मानव जाति को महामारियों से सुरक्षित रखने के लिए पूजा जाता है। देवी सहस्त्रनाम में गणेशवी, विनायकी, लंबोदरी, और गणेश्वरी जैसे नामों से संबोधित किया गया है। मत्स्य पुराण और स्कंद पुराण में भी विनायकी का उल्लेख किया गया है और गजानना, वैनायिकी जैसे नाम आए हैं। बौद्ध ग्रंथों में गणपति हृदय का उल्लेख है, और जैन ग्रंथों में विनायकी को 36वें क्रम में शामिल किया गया है। मत्स्य पुराण के तीसरे सदी के 179वें अध्याय में वर्णित है कि अंधकासुर वध के बाद भगवान शिव ने रक्त को पीने के लिए लगभग 200 माताओं को उत्पन्न किया, जिनमें एक मातृका विनायिकी बताई गई है।
TANTRA SADHANA

The huge vinayaka sculpture inside the Uchhipillaiyar temple, Rockfort, in Tiruchi. | Photo Credit: R.M. RAJARATHINAM
The annual Ganesh Chaturthi or Vinayaka Chaturthi, is a grand spectacle that goes beyond religious realms and celebrates unity among people. Adding to the festive spirit is the musical element. Other than devotionals, there are several kritis, composed by the vaggeyakaras, extolling Ganesha. Each one is unique in its own way — lyrics, ragas, intricate swara patterns, and tala.

Rithvik Raja. | Photo Credit: K. V. SRINIVASAN
Carnatic vocalist Rithvik Raja shares his favourite five kritis composed by Muthuswami Dikshitar. “The beauty of this selection is that Dikshitar has envisioned these compositions in diverse ways,” he says.
A Tanjore painting of Ganesha. | Photo Credit: The Hindu Archives
Vatapi ganapatim: This composition has grown on me over time, especially after I learnt it from the Sangita Sampradaya Pradarshini. The melodic graph moves through the raga quite spectacularly with intricate jarus and swaraksharas, offering a unique perspective of Hamsadhwani. The indie version of this song is popular too.

Different forms of the deity displayed at the Poompuhar exhibition in Coimbatore. | Photo Credit: SIVA SARAVANAN S
Pancha matanga mukha ganapatina: Composed in Malahari, it is a testament to the idea of beauty in simplicity. The raga receives expert treatment and gives us new insights into the possibilities that it offers.
Hastivadanaya: This composition in Navaroj has a distinct gait and texture. Dikshitar has chosen words that match the tempo, thereby coming up with a rare kriti on Ganesha. The raga mudra has been infused into this composition in an unusual way.

This 1971 picture shows a Vinayaka sculpture placed inside a Shiva temple at Tharuvai, located between Tirunelveli and Ambasamudram. | Photo Credit: The Hindu Archives
Sri muladhara chakra: Dikshitar has explored Shri raga, in which this composition is set. The manner in which he handles the nishadam is especially notable in this composition. While most Ganesha songs describe his form, this one focuses on the deeper meaning behind it. This is also the only Shri raga exploration by Dikshitar that does not engage the unique ‘PDNP’ phrase.
Mahaganapate palayasumam: This song in raga Natanarayani is close to my heart because this was the one that I first learnt from my guru T.M. Krishna. Though the composition is short, it presents a distinct picture of the raga, and the extent to which it can be expanded.
या अवतारात वक्रतुंड उपासना करून ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य कसे मिळवले याची कथा आहे. हा अवतार हा या आद्यदेवतेचा म्हणजेच श्री गणेशाचा पहिला अवतार आहे. याचे स्वरूप - रक्तवर्ण अंगकांती, हत्तीचे तोंड व सर्वांगी शेंदूर चर्चिलेली अशी चतुर्भुज सगुण मूर्ती आहे.
सृष्टीमध्ये एकदा महाप्रलय झाला. सर्व ब्रह्मांड जलमय झाले. फक्त शिल्लक राहिले ते चराचरात व्यापून राहिलेले शुद्ध चैतन्य. तोच परमात्मा अथवा परमेश्वर.
अशा या परमेश्वराला पुन्हा सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली. त्याने आपल्या मायेने सत्व, रज आणि तम असे तीन गुण निर्माण केले. सत्वापासून ब्रह्मदेव निर्माण झाला. रजापासून श्रीविष्णू प्रकट झाला. तमापासून शिव-शंकर प्रकट झाला. याच परमेश्वराच्या इच्छेने ब्रह्मदेवाला ज्ञानप्राप्ती झाली. सृष्टी पुन्हा निर्माण करण्याचे कार्य ब्रह्मदेवाला सांगून परमेश्वर अंतर्धान पावला.
त्या ईश्वराच्या इच्छेनुसार ब्रह्मदेवाने पुन्हा सृष्टी निर्माण करण्याचे कार्य सुरु केले. कार्यारंभ सुरु केल्यावर त्यात भयंकर विघ्ने निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्या सृष्टीनिर्मितीच्या कामात अडथळा निर्माण करू लागली. ब्रह्मदेवाचे सृष्टी निर्मितीचे काम पुढे सरकेनाच. कोणी ब्रह्मदेवाचा हात ओढू लागले. तर कोणी त्याची शेंडी खेचून त्यास दुःख देऊ लागले. कुणी मेघांच्या गडगडाटासारखे भयंकर गर्जना करू लागले. कुणी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत तर कुणी गुप्तपणे वार करत. ब्रह्मदेव अतिशय भयभीत झाला. संकट निवारण करण्यासाठी त्याने अनेक उपाय केले. पण व्यर्थ! या संकंटांपुढे त्याचे काहीही चालेना. त्याच्या सृष्टी निर्मितीचे काम पुढे सरकेना. परमेश्वर अंतर्धान पावला होता. हे दुःख सांगावे कुणाला हे ब्रह्मदेवाला समजेना.
अखेर ब्रह्मदेवाने अतिशय गोड शब्दात परमात्म्याची करूणा भाकली. त्याची प्रार्थना करून ब्रह्मदेव म्हणाला "हे परमेश्वरा, तुझ्या आज्ञेने मी सृष्टी निर्माण करण्यास प्रारंभ केला खरा, पण हे कार्य करण्यात अत्यंत अडथळे येत आहेत. दुष्ट शक्ती नाना संकटे आणून माझ्या कार्यात विघ्ने आणत आहेत. त्यांच्या पुढे माझे वेदमंत्रही कुंठित झाले आहेत. ही विघ्ने निवारण्यास मी खरोखरच असमर्थ आहे. आणि म्हणूनच हे परमात्म्या, मी तुला अनन्य शरण आलो आहे."
ब्रह्मदेवाची स्तुती ऐकून विनायक संतुष्ट झाला आणि सगुणरूपाने प्रकट झाला. त्याने ब्रह्मदेवाला "ॐ नमो वक्रतुंडाय" हा जप करण्यास सांगितले. त्याने सांगितले "हा मंत्र जपल्यास तुझे इच्छित कार्य पूर्ण होईल. वक्रतुंडाच्या कृपेने तुझे कार्य निर्विघ्न पार पडेल." असे अभयवचन देऊन विनायक अंतर्धान पावला. विनायकाने दिलेल्या वराने ब्रह्मदेव आनंदित होऊन तपश्चर्येला बसला. एकाग्र मनाने दिवसरात्र त्याने वक्रतुंड मंत्राचा जप चालू केला. बारा वर्षे तपश्चर्या केल्यावर त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन वक्रतुंड विनायक महाकाय रूपाने प्रकट झाला. रक्तासारखी लाल अंगकांती, क्रूर नेत्र, सोंड आणि संपूर्ण तोंडावर शेंदूर चर्चिलेला, असा तो कोटीसूर्याहूनही तेजस्वी असा विनायक प्रकट झाला. त्याच्या दिव्य तेजाने सर्व त्रैलोक्य भरून गेले. ब्रह्मदेव भारावून गेला. हात जोडून उभा राहिला. वक्रतुंडाने आशीर्वाद दिला "तू तुझे सृष्टी निर्मितीचे कार्य सुरु कर. जी विघ्ने येतील त्यांचा मी संहार करीन." हे ऐकून ब्रह्मदेवास आनंद झाला. त्याक्षणी विनायक अंतर्धान पावला.
मग ब्रह्मदेवाने वक्रतुंडास स्मरून सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त अशी सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली. प्रथम वृक्ष, लता वेली निर्माण केल्या. झरे, नद्या, तलाव निर्माण केले. तऱ्हेतऱ्हेचे पक्षी, सरपटणारे प्राणी, किडे, जीव जंतू निर्माण केले. लहान मोठे तऱ्हेतऱ्हेचे अनेक पशु निर्माण केले. पण त्याच्या मनाचे समाधान झाले नाही. त्याला स्वतःच्या बुद्धीने काम करणारा, स्वतःच्या विचाराने चालणारा, आत्मकल्याणासाठी प्रयत्न करणारा प्राणी निर्माण करायचा होता. मग वक्रतुंडाला स्मरून महत् प्रयासाने त्याने हा मनुष्य प्राणी निर्माण केला. तो निर्माण करूनच ब्रह्मदेवाला समाधान झाले. म्हणूनच मनुष्य जन्म दुर्लभ आहे असे व्यासांनी लिहून ठेवले आहे. जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होते तेव्हाच मनुष्यदेह लाभतो. म्हणूनच मनुष्याने आत्मकल्याणासाठी वक्रतुंडाची नेहमी भक्ती करावी. त्याचे सतत नामस्मरण करावे.
वक्रतुंड हा दयाळू आहे. भक्तांचा कैवारी आहे. विघ्नविनाशक असा हा वक्रतुंड भक्तांची संकटे दूर करतो. त्यांचा उद्धार करतो. म्हणून "श्री वक्रतुंडाय नमः" हा जप सतत करून वक्रतुंडाला स्मरावे. त्यातच मनुष्याचे कल्याण आहे.
अवतार दुसरा - कपिल चिंतामणी - अध्याय २ ते ६ - विनायक विजय
या अवतारात श्री गणेशाने द्रविडदेशीचा राजा अभिजित व राणी गुणवती यांचा पुत्र गणदैत्य, ज्याने कपिल ऋषींच्या आश्रमातून त्यांचा चिंतामणी नावाचा रत्नमणी जबरदस्तीने हिरावून घेतला, त्याच्याशी युद्ध करून व त्याचा वध करून कपिलऋषींना त्यांचा चिंतामणी त्यांना परत आणून दिला. कपिलऋषींनी तोच चिंतामणी श्री गणेशाच्या कंठात घातला, म्हणून सर्व ऋषींनी त्याचे नाव चिंतामणी असे ठेवले.
या अवतारात श्री गणेश सिंहावर बसलेला, दिव्यवस्त्रे व अलंकार धारण केलेला, चतुर्भुज - चार हातात परशु, कमल, मोदक व गदा हि आयुधे धारण केलेला, असा आहे. कपिल मुनींच्या अनुष्ठानाने यज्ञकुंडातून प्रकट झाला म्हणून याचे नाव कपिल, असा हा कपिल चिंतामणी अवतार.
पूर्वी द्रविड देशात अभिजित नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राणीचे नांव गुणवती. दोघेही धर्मशील, व्रती आणि दानशूर होते. राज्यात सुख, समृद्धी व समाधान होते. प्रजा सुखी होती. एकच दुःख होते. राजाला मुलबाळ नव्हते. विविध व्रते, दाने, होम हवन करूनही उपयोग झाला नाही. शेवटी तपाकरिता आपण अरण्यात जावे असा विचार करून प्रधानावर राज्य सोपवून राजाराणी बाहेर पडले. फिरता फिरता एका उपवनात एक शोभिवंत आश्रम त्यांनी पाहिला. तो वैशंपायन ऋषींचा आश्रम होता. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार केला. वैशंपायन ऋषींनी अंतर्ज्ञानाने राजाचे दुःख जाणले व त्या दोघांना सिंधुतीरी जाऊन तिथल्या सरोवराकाठी हवन व जप करण्यास सांगितले. चार महिने व्रतस्थ राहून मग घरी जाण्यास सांगितले. वैशंपायन ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने सरोवराच्या तीरावर जप होम हवन केले. चार महिने दोघे व्रतस्थ राहिले. मध्यंतरीच्या काळात ब्रह्मदेव वासनांध होऊन आपल्याच कन्येच्या सरस्वतीच्या मागे लागला. पण नंतर त्याला पश्चात्ताप होऊन त्याने आपले दुर्वीर्य त्या सरोवराच्या पाण्यात टाकून दिले. योगायोगाने त्याच सरोवरतीरी राहणाऱ्या गुणवती राणीने ते पाणी प्यायले व तिला गर्भ राहिला. राजाला फार आनंद झाला. चार महिनेही पूर्ण झाले होते. दोघेहीजण हर्षभरित होऊन नगरात परतले. नऊ मास पूर्ण झाल्यावर गुणवतीला पुत्र झाला. त्याचे नाव गण असे ठेवले. लहानपणापासूनच तो बलाढ्य होता. पूर्वसुकृतानुसार गणाला वनात जाऊन तपश्चर्या करावेसे वाटले. आई वडिलांची आज्ञा घेऊन तो घोर अरण्यात गेला. “ॐ नमः शिवाय” या पंचाक्षरी जपाने त्याने एकाग्रमनाने तपश्चर्येला प्रारंभ केला. दहा वर्षे एका पायावर उभे राहून व तितकीच वर्षे वायुभक्षण करून व तीस वर्षे केवळ पाणी पिऊन काढली. थंडी वारा ऊन पाऊस यांची पर्वा केली नाही. गणाचे उग्रतप बघून इंद्राला आपलेच इंद्रपद जाईल अशी भीती वाटली व सर्व देव मिळून शिवशंकराला शरण गेले व त्यांना सर्व हकीकत निवेदन केली. शिवशंकर तप करणाऱ्या गणाजवळ गेले व संतुष्ट होऊन त्यास वर मागण्यास सांगितले. त्याने तुझी कृपादृष्टी माझ्यावर नेहमीच राहो असा वर मागितला. शंकराने तो वर तर दिलाच शिवाय तू त्रैलोक्यात विजयी होशील, तुला देवांकडून मरण येणार नाही असा वर देऊन शंकर अंतर्धान पावले. गणाला अत्यंत आनंद झाला. नगरात परत जाऊन त्याने आपल्या आईवडिलांना हे वृत्त सांगितले. अभिजित राजानेही आनंदून त्याच्यावर सर्व राज्यकारभार सोपविला. राजा होताच गण दैत्य उन्मत्त झाला. त्यात शंकराचे वरदान असल्याने तो स्वतःला अजेय समजू लागला. त्याने आपले सैन्य अपरिमित वाढविले. शस्त्रास्त्रांनी परिपूर्ण केले. त्याला कुणाचीच भीती वाटेनाशी झाली.
एकदा त्याने स्वर्गावर वारी करून इंद्रालाही हरवले व परत त्याला त्याचे इंद्रपद देऊन टाकले. दिवसेंदिवस गणदैत्य अहंकारी व उन्मत्त झाला. एकदा तो सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. तिथे त्याने कपिलमुनींचा आश्रम पाहिला. तो कपिलमुनींना भेटण्यास गेला. त्याने कपिलमुनींच्या कंठात दिव्य रत्नमणी पाहिला. त्या रत्नमणीच्या तेजाने सर्व आश्रम उजळला होता. त्या रत्नमणीचे नाव चिंतामणी असे होते. कपिलमुनींचे दर्शन घेऊन गणदैत्याने परत जाण्याची अनुज्ञा मागितली. कपिलमुनींनी मध्यान्ह समय असल्याने दैत्यराजाला जेऊन जाण्यास सांगितले. दैत्यराजाने आपले सैन्य बरोबर असल्याने सैन्याला उपाशी ठेऊन भोजन करणे योग्य नाही असे सांगितले. त्यावर कपिलमुनींनी दैत्यराजाला ससैन्य भोजनाचे निमंत्रण दिले व सर्वांना चविष्ट भोजनही दिले. गणदैत्याला आश्चर्य वाटले. मग त्याला समजले कि हि त्या चिंतामणीची किमया आहे. त्याने तो चिंतामणी कपिलमुनींजवळ मागितला. कपिलमुनींनी नकार दिला. गणदैत्याने रागावून जबरदस्तीने तो चिंतामणी हिरावून घेतला. कपिलमुनींनी क्रोधीत होऊन गणदैत्याला शाप दिला “त्रैलोक्याला छळणारा तू कृतघ्न आहेस. माझ्या आश्रमात तू मला छळण्यासाठी का आलास? तुझा वध करण्यासाठी परमात्मा अवतार घेईल. लवकर तुझे तोंड काळे कर, नाहीतर भस्म होशील.” शापवाणी ऐकून गणदैत्य खिन्न झाला, पण तो दिव्य चिंतामणी घेऊन तो नगरात परत आला. आश्रमातील वृत्त ऐकून अभिजित राजाला दुःख झाले, पण गणदैत्य मात्र निर्भयपणे राज्यकारभार करीत होता. त्यात तो चिंतामणी मिळाल्याने तो पूर्ण ब्रह्माण्डात प्रसिद्ध झाला. इकडे आश्रमात चिंतामणी पळवून नेल्याने कपिलमुनी दुःखाने मूर्च्छित झाले. सावध झाल्यावर पूर्ण एकाग्रतेने ध्यानास बसले. त्यांच्यापुढे आदिमाया प्रकट झाली. शंकरांनी त्रैलोक्यात अजिंक्य होशील असा वर दिल्यानेच गणदैत्य उन्मत्त झाला आहे असे तिने सांगितले. परमात्मा विनायकच त्याचा नाश करेल असेही सांगितले. कपिलमुनींनी विचारले कि त्याला किती अवधी लागेल? आदिमायेने कपिलमुनींना “गं” या मंत्राचा उपदेश दिला. कपिलमुनींनी अहोरात्र एकाग्र मनाने हा जप केल्यास होमकुंडातून स्वतः विनायकाची चतुर्भुज मूर्ती प्रकट होईल असे सांगितले. आदिमायेने सांगितल्याप्रमाणे कपिलमुनींनी अनुष्ठान सुरु केले. अहोरात्र हवन, जप, ब्राह्मण भोजन सुरु ठेवले. शेवटी होमकुंडातून दैदिप्यमान विनायकमूर्ती प्रकट झाली. त्रैलोक्यास पिडणाऱ्या, देव संन्यासी ब्राह्मण व संत सज्जनांना छळणाऱ्या गणदैत्याचा नाश करून तुझा चिंतामणी तुला परत आणून देण्यासाठीच मी अवतार घेतला आहे असे विनायकाने सांगितले.
इकडे गणदैत्याला स्वप्न पडले. एका चतुर्भुज दिव्य तेजस्वी पुरुषाने, ज्याच्या हातात परशु कमल मोदक अशी आयुधे विजेसारखी लवलवत आहेत, त्याने कपिलमुनींसह येऊन माझे सर्व सैन्य भक्षण केले व माझे मस्तक छेदले. स्वप्नाने भयकंपित होऊन गणदैत्याने आपल्या प्रधानांना व पुत्रांना आपले स्वप्न सांगितले. प्रधानांच्या व पुत्रांच्या इच्छेनुसार गणदैत्य क्रोधीत होऊन स्वतःच प्रचंड सैन्य घेऊन वडिलांच्या विरोधाला न जुमानता, कपिल मुनींच्या आश्रमावर चाल करून गेला. वेदिकेमध्ये त्याने चतुर्भुज, विक्राळ शरीराचा, चारही हातात आयुधे असलेला, रक्तरंगी वस्त्र नेसलेला, रक्तरंगी पुष्पे धारण केलेला, सिंहावर बसलेला गणपती पाहिला जो त्याने स्वप्नात पाहिला होता. गणपतीसहित बसलेल्या सिध्दीने युद्ध करण्याची अनुज्ञा गणपतीस मागितली. गणपतीने ती आनंदाने दिल्यावर सिध्दीने रणांगणात जाऊन तीन पायांचे, चार पायांचे, तसेच चतुर्मुखी, पंचमुखी, बारामुखी असे अक्राळविक्राळ देहाचे प्राणी शस्त्रांसहित निर्माण केले. परंतु सिद्धीच्या सैन्याचा गणदैत्याच्या सैन्यापुढे टिकाव लागेना. तेंव्हा सिध्दीने मानससुत निर्माण केला. त्याचे नाव लक्ष. हा महाशूर होता. त्याने आपल्या दिव्य अस्त्रांनी असंख्य दैत्य मारले. त्याच्या बाणांनी अवघे आकाश भरले. सूर्यालाही त्यांनी व्यापून टाकले. दैत्यसैन्य धारातीर्थी पडू लागले. उरलेसुरले सैन्य सैरावैरा पळू लागले. गणदैत्याचे फक्त दोन पुत्र रणांगणावर उरले, सुलभ व शूलपाणी. तेही पलायनाचा विचार करू लागले., तेवढ्यात वाऱ्याच्या गतीने लक्ष धावला, त्यांच्या रथासहित त्या दोघांना पकडून त्याने स्वतःच्या सैन्यात आणले. पित्याला वंदून लक्ष म्हणाला, “आपण गणदैत्याला ठार करून ह्यांना राज्यावर बसवावे”
इकडे रणांगणावर कुणीही दैत्यसैन्य उरले नाही. एका सैनिकाने ही सर्व वार्ता व दोन्ही पुत्रांना धरून नेल्याची वार्ता गणदैत्यास सांगितली. गणदैत्यावर वज्राघात झाला. तो मूर्च्छित झाला. दुःखाने व्याकुळ झाला. परंतु त्याच्या प्रधानांनी त्याला समजावल्यावर त्वेषाने पुन्हा सैन्य घेऊन रणांगणावर गेला, ती मी मरेन अथवा मारिन अशी प्रतिज्ञा करूनच. कपिलमुंनींच्या आश्रमात जाऊन बघितले असता त्याने ती चतुर्भुज मूर्ती पाहिली. त्याच्या दोन्ही बाजूस सिद्धीबुद्धी होत्या व ती सूर्याहूनही अति तेजस्वी अशी विनायकाची मूर्ति सिंहावर आरूढ झाली होती. ती मूर्ति पाहताक्षणी गणदैत्याची सेना भयकंपित झाली. गणदैत्याने कपिलमुनींना क्रोधाविष्ट होऊन विचारले “हा पुरुष कोणीकडून आला आहे? सांग नाहीतर एकाच बाणाने तुम्हा दोघांचा मी प्राण घेईन.” ते ऐकून कपिल ऋषी क्रोधाने म्हणाले “दुष्टा, तू सर्व देव, गायी, ब्राह्मण, संत, सज्जन ह्यांना छळलेस, त्याची फळे भोग! तुला मारण्यासाठी हा प्रत्यक्ष परमात्मा अवतरला आहे!” हे ऐकून क्रोधीत होऊन गणदैत्याने पांच बाण विनायकावर सोडले. दोन वाया गेले. तीन विनायकाला लागले. विनायकाने मूर्च्छित झाल्याचे नाटक केले. ते बघून दैत्याने विजयाची आरोळी मारली. त्या संधीचा फायदा घेऊन विनायकाने परशुने त्याला कंठस्नान घातले. त्याचा शिरच्छेद केला. त्याचे मस्तक आभाळात उडाले व धड धरणीवर पडले. ऋषी जयजयकार करू लागले. दैत्यसैन्यात हा:हा:कार माजला.
गणदैत्य रणांगणावर पडल्याचे समजल्यावर त्याच्या पित्याला राजा अभिजीतला अतोनात दुःख झाले. पण ही पुत्राच्याच कर्माची फळे आहेत हे त्याने जाणले. अभिजित राजा तो चिंतामणी घेऊन स्वतः कपिलमुनींच्या आश्रमात गेला व विनायक आणि कपिलमुनींना दोघांना वंदन करून त्याने तो चिंतामणी कपिलमुनींच्या हवाली केला. कपिलमुनींनी विनायकाच्याच गळ्यात तो चिंतामणी घातला व म्हटले “तू दुष्ट दैत्याला मारून हा चिंतामणी माझ्याकरता परत मिळविलास म्हणून आजपासून चिंतामणी ह्या नावाने ब्रह्माण्डात ख्यात होशील”
हा चिंतामणी स्वर्गाचा राजा इंद्र ह्याला श्री विष्णूंनी दिला होता. इंद्राने कपिलमुनींच्या आश्रमातील आतिथ्याने प्रसन्न होऊन त्यांना हा चिंतामणी दिला होता. हे कथानक ऐकल्याने श्रवण करणाऱ्यांची पापे नष्ट होतात. त्यांचे दोष नष्ट होतात. व त्यांना सुख लाभते. असा हा “चिंतामणी” अध्याय समाप्त.
विनायकाचा अवतार तिसरा - गजानन - अध्याय ७ ते १० - श्री विनायक विजय
या अवतारात विनायकाने सिंदुरासूराचा वध केला. शस्त्राने त्याला मरण नसल्यामुळे विनायकाने दोन्ही हातांनी धरून त्याचे मर्दन केले. पिळून त्याचे चूर्ण करून तो सिंदूर आपल्या सर्वांगाला लावला. तेव्हांपासून देवाला सिंदूर आवडू लागला.
शंकर पार्वतीच्या पुत्राला गजासुराचे मस्तक लावल्याने देवांनी व ऋषींनी गजानन नाव ठेवले. किरीट कुंडले धारण केलेला, पितांबर नेसलेला, चतुर्बाहु, दिव्य आयुधे धारण केलेला असे ह्या गजाननाचे स्वरूप आहे. जवळ सिद्धी बुद्धी आहेत. विराट रूप म्हणून "विकट" नाव. भव्य देह म्हणून "महाकाय". शंकराने प्रेमाने आपली चंद्रकला त्याच्या मस्तकावर ठेवली म्हणून "भालचंद्र" अशी नावे पडली. जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला!
एकदा ब्रह्मदेवांना जांभई आली. तेव्हां त्यांच्या मुखातून एक रक्तवर्णाचा, क्रूर चेहरा असलेला पुरुष बाहेर पडला. त्याच्या शरीराला येणाऱ्या सुगंधाने दाही दिशा व्यापल्या होत्या. ब्रह्मदेवाने आश्चर्याने विचारले "तू कोण? कुठून आलास?" त्या पुरुषाने उत्तर दिले "मी तुमचाच पुत्र आहे. तुमच्या मुखातून मी जन्म घेतला आहे. आता माझे नाव ठेवा व मला राहण्यासाठी उत्तम स्थान द्या. तुमच्या कृपेने माझा चरितार्थ मी स्वतः चालवीन."
ब्रह्मदेव म्हणाला "तुझे नांव सिंदूर. पृथ्वीवर हव्या त्या स्थानी तू रहा. तुला मी आणखी एक वर देतो. तुला शस्त्रास्त्रांपासून, विष्णू इंद्र आदी देवांपासून मृत्यूचे भय नाही. तू ज्याला मिठी मारशील त्याचे तात्काळ भस्म होईल!" सिंदुराला आनंद झाला. जे तपश्चर्येने व यज्ञ करूनही मिळायला अवघड असे दुर्लभ वर त्याला विनासायास मिळाले होते.
परत फिरताना त्याला दुर्बुद्धी सुचली व तो आपल्या वराची प्रचिती पाहण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला मिठी मारायला निघाला. ब्रह्मदेवाला आता वर दिल्याचा पश्चात्ताप झाला. तो क्रोधाने म्हणाला "तुझा संहार करण्यासाठी विनायक अवतार घेईल". या शापाने भयभीत न होता सिंदूर पुढे सरसावला. ब्रह्मदेव आपल्या आसनासहित वैकुंठमार्गाने श्री विष्णूंकडे निघाला. मागोमाग सिंदुरही गेला. ब्रह्मदेवाने सर्व वृत्तांत श्री विष्णूला कथन केला. श्री विष्णू म्हणाले "तुम्ही जरी अविचाराने वर दिला तरी तो खोटा होंणार नाही. हा दैत्य सर्व त्रैलोक्याचा नाश करेल. जर विनायकाने अवतार घेतला तरच याचा नाश होईल." इतक्यात सिंदूर दैत्य तेथे पोहोचला व त्याने श्री विष्णू व ब्रह्मदेव यांना युद्धाचे आव्हान दिले. श्री विष्णू म्हणाले "मी सत्वापासून निर्माण झालो आहे. निर्गुण, निरिच्छ आहे. ब्रह्मदेव वेदशास्त्रसंपन्न आहेत. आम्हाला दोघांनाही युद्धात स्वारस्य नाही. तू श्री शंकरांकडे जाऊन त्यांना युद्धाचे आव्हान दे"
उन्मत्त असा तो सिंदूर दैत्य कैलासावर गेला. शिवमंदिरात पोहोचला. भस्म चर्चित, गजचर्म परिधान केलेली, हातात खट्वाङ्ग असलेली, जटेत गंगा असलेली चंद्रमौळी श्री शंकरांची ध्यानस्थ सुंदर मूर्ती बघून, सिंदूर दैत्याचे मन फिरले. त्याला वाटले त्याला मिठी मारण्यापेक्षा याच्या मांडीवर बसलेल्या पार्वतीलाच न्यावे. त्याने पार्वतीची वेणी ओढून तिला जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला. भयभीत होऊन पार्वतीने आक्रोश केला. श्री शंकरांची कळवळून प्रार्थना केली पण श्री शंकर ध्यानातून जागे झाले नाहीत.
ध्यानातून जागे झाल्यावर शिवगणांनी श्री शंकरांना सर्व वृत्त सांगितले. अत्यंत क्रोधित होऊन श्री शंकर हातात डमरू व त्रिशूल घेऊन नंदीवर बसून सिंदूर दैत्याकडे निघाले. त्याने आपल्या डमरूचा प्रहार सिंदुरावर केला. सिंदूर क्षणभर थांबला व श्री शंकरांना मिठी मारायला निघाला, तितक्यात एक दिव्य ब्राह्मण दोघांमध्ये प्रकट झाला. तो ब्राह्मण सिंदुराला म्हणाला "तू माझ्या समक्ष शंकरांना जिंकलेस तर पार्वती तुझी झाली." बोलता बोलता ब्राह्मणाने गुप्त परशु सिंदुरासुरावर सोडला. तो लागताच सिंदुरासूर शक्तिहीन झाला. दिव्य ब्राह्मणाने म्हटले "सिंदुरासुरा आता प्राण वाचवायचे असतील तर सत्वर पलायन कर, नाहीतर श्री शंकरांच्या त्रिशुळाच्या आघाताने तू मरशील" ते ऐकून पार्वतीला सोडून देऊन, पण क्रोधाने सिंदूर दैत्य पृथ्वीवर परतला.
पार्वतीने ब्राह्मणाला विचारले "या दुष्टापासून मला सोडवलेत. आपण कोण आहात?" उत्तरादाखल ब्राह्मण आपल्या मूळ रूपात प्रकट झाला. पार्वती समोर सगुण रूपात विनायक प्रकट झाला. चतुर्भुज, किरीट कुंडले घातलेली, सिद्धी बुद्धी दोन बाजूस असलेली, सिंहावर आरूढ झालेली अशी विनायकाची मूर्ती बघताच पार्वतीला आनंद झाला. विनायक पार्वतीला म्हणाला "तुला दुःख देणाऱ्या सिंदूर दैत्याचा मी नाश करिन. त्याकरता मी तुझ्याच पोटी जन्म घेईन" हे बोलून विनायक अंतर्धान पावले.
इकडे सिंदुरासुराने सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली. कित्येकांना मिठी मारून भस्म केले. कित्येक ब्राह्मणांना जीवे मारले. कित्येक क्षत्रियांचा वध केला. कित्येकांचे पुत्र मारले. यज्ञयागांचा विध्वंस केला. देव ब्राह्मण संत संन्यासी, पृथ्वीवरील शूर राजे, कुणालाच सोडले नाही. शेवटी सर्व देवांनी विनायकाची प्रार्थना केली. विनायकाने पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन सिंदुरासुराचा वध करेन असे आश्वासन दिले.
पार्वतीला डोहाळे लागले. दिवसेंदिवस गर्भ वाढू लागला. एकदा पृथ्वीवर रमणीय उपवनात जाऊन कांही दिवस राहावे असे वाटू लागले. तिने श्री शंकरांना सांगितले. दोघेही नदीवर बसून पृथ्वीवर आले. तिथले दाट, सुगंधी झाडांनी वेलींनी युक्त असे रमणीय पर्यळी उपवन त्यांना दिसले. त्यांनी आपल्या सर्व शिवगणांसह तिथेच मुक्काम करण्याचे ठरवले.
एकदा गजासुर नावाच्या श्री शंकरांच्या भक्ताने, जो हत्ती होता, त्याने पर्यळी उपवनात शिवगणांनी खास पार्वतीकरता उभारलेला मंडप आपल्या सोंडेने उध्वस्त केला. हा गजासुर गतजन्मात महेश नांवाचा राजा होता. अत्यंत देवभक्त, पुराणे ऐकणारा, जपजाप्य करणारा, असा त्रिभुवनात प्रख्यात होता. एकदा त्याच्या राजवाडयात देवगुरु बृहस्पती आले. त्यांची राजाने यथाविधी पूजा केली. त्यांच्या पायावर स्वतःचे मस्तक ठेऊन त्यांना वंदन केले. बृहस्पतीने त्याच्या आदरातिथ्याने भारावून जात त्याला आशीर्वाद दिला "जे मस्तक माझ्या पायावर ठेवलेस ते मस्तक तिन्ही जगतात सर्व देव ऋषींना पूज्य होईल. पुढच्या जन्मी तू गजराजाच्या योनीत जन्माला येशील तेव्हां तुझे मस्तक छेदून स्वतः श्री शंकर तुला मुक्ती देतील.
एकदा महेश राजाने मार्गाने जात असलेल्या नारदमुनींना वंदन केले नाही. तेव्हां रागावून नारदमुनींनी त्याला पुढच्या जन्मी तुझे मुख हत्तीचे होईल व शंकर तुला कैलासात नेतील असा शाप देऊन निघून गेले.
पुढे महेश राजा मरण पावला व पर्यळी वनात गजमुखाने जन्मला. हत्तीचे मुख सोडल्यास देह नराचा होता. देव राक्षस गंधर्व कुणीच त्याच्या बरोबरीला नव्हते. असा हा गजासुर! त्याने मंडप तोडला. शिवगण त्याला पाहून भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले. पार्वतीने हे श्री शंकरांना सांगताच श्री शंकरांनी क्रोधीत होऊन त्रिशुळाने त्याचे मस्तक छेदले. अंतःसमयी त्या गजासुराने "ॐ नमः शिवाय" म्हणून प्राण सोडला.
श्री शंकर म्हणाले "मग मी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला मुक्ती दिली व त्याचे गजमुख माझ्या पूजास्थानी ठेवले. त्याचे चर्म मी स्वतः पांघरले. त्याचे चर्म पांघरले म्हणून माझे नांव महेश पडले."
इकडे सिंदुरासूर गर्वाने म्हणत होता "मला देव मनुष्य राक्षस यांपासून मृत्यू नाही." तोच आकाशवाणी झाली "मुर्खा तुझा वध करण्याकरता स्वतः परमात्मा विनायकाने पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे. तिच्या उदरात त्याचा गर्भ वाढतो आहे." ते ऐकून क्रोधीत होऊन गर्भातच शत्रूचा नाश करण्यासाठी तो कैलासावर गेला. तेथे कुणी नाही हे पाहून पर्यळी उपवनात आला. श्री शंकर व पार्वती निद्रिस्त होते हे पाहून तो वायुरूपाने पार्वतीच्या उदरात शिरला व नखाने गर्भाचे शिर तोडून बाहेर आला. ते शिर त्याने नर्मदेच्या कुंडात टाकले. त्यामुळे नर्मदेतील पाषाणही रक्तासारखे लाल झाले. सर्व लाल पाषाण नर्मदी गणपती म्हणून प्रसिद्ध झाले. तो दैत्य आपले काम करून गेला. पण निद्रावस्थेत असल्याने कुणाला काही कळले नाही.
काही दिवस उलटल्यावर पार्वतीच्या इच्छेनुसार सर्व परत कैलासावर पोहोचले. नऊ मास भरल्यावर पार्वतीने एका बालकास जन्म दिला. पण ते बालक मस्तकविरहित होते. ते पाहून पार्वतीस अनावर शोक झाला व तिने शंकरांना बोलावले. श्री शंकरही दुःखाने व्याकुळ झाले व नंदीला बोलावून त्यांनी सर्व देवांना हे मस्तक विरहित बालक बघण्यास बोलावले.
सर्व देव धावून आले. ते मस्तक विरहित बालक बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेवढ्यात ते बालक बोलू लागले. "सिंदुरासुराचा वध करण्यासाठी मी पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे." बृहस्पतीने त्याच्या मस्तकाविषयी विचारले असता विनायकाने बृहस्पतीस महेश राजाची आठवण दिली व श्री शंकरांच्या पूजास्थानीचे गजमुख लावण्यास सांगितले. आपले मस्तक सिंदुरासुरानेच कुणाच्याही नकळत गर्भावस्थेतच नखाने छेदले हेही सांगितले.
नारदाने सांगितले "आम्ही कुणीच गजमुख लावण्याच्या योग्यतेचे नाही. केवळ आपल्या प्रभावानेच ते शक्य होईल." असे सांगितल्यावर काहीच क्षणात गजमुख धारण केलेले विनायक, चतुर्भुज अवतारात, सिद्धीबुद्धी सह प्रकट झाले. नारदांनी सिंदुरासुराकडे जाऊन त्याला तुझ्या शत्रूचा जन्म कैलासावर झाला आहे असे सांगितले. सिंदुरासूर क्रोधीत झाला व आपल्या शत्रूला मारण्यासाठी कैलासावर चाल करून गेला. विनायकाला बालरुपात पाहून "तू अंगणात खेळण्याऐवजी इथे कसा आलास?" असे विचारले. ते ऐकून विनायकाने महाकाय रूप प्रकट केले. ते पाहून सिंदुरासूर भयकंपित झाला. विनायकाने दोन्ही हातांनी सिंदुरासुराचे मर्दन केले व त्याच्या सर्व रक्तांगाचे चूर्ण करून आपल्या अंगास लावले. सर्व दिशांत सुगंध भरून राहिला. सर्व देव ऋषी यांना आनंद झाला. सर्वांनी विनायकाचे पूजन केले. तोच सर्वांदेखत गजानन अवतार धारण केलेला विनायक अंतर्धान पावला. असा हा गजानन अवतार अध्याय समाप्त!
विनायकाचा अवतार चौथा - विघ्नेश्वर - अध्याय ११ व १२ - श्री विनायक विजय
या अध्यायात विनायकाने विघ्नासुराचा पराभव केला. त्याने प्रार्थना केल्याने देवाने विघ्नराज हे धारण केले. मूषक हे वाहन आरोहणासाठी घेतल्याने "मूषकवाहन" नांव पडले.
चतुर्भुज, पाश, अंकुश, परशु, कमल ही आयुधे धारण केलेला, मूषकावर आरूढ झालेला असे विनायकाचे या अवतारात स्वरूप आहे.
पूर्वी हिमालयात सौभरी नांवाचे ऋषी रहात होते. त्यांच्या भार्येचे नांव सुशीलमति. ते दोघेही कंदमुळे व शेतातील एकेक दाणा जमवून त्यावर उदरनिर्वाह करीत. एके दिवशी एक गंधर्व त्यांच्या पर्णकुटीत आला. ऋषीपत्नी सुशीलमतिला पाहून तो मोहित झाला व तिला आपल्याबरोबर चलण्याविषयी बोलू लागला. सुशीलमतिने क्रोधाने म्हटले "माझा हात सोड नाहीतर मी तुला शाप देईन". तेवढ्यात सौभरीं ऋषीही तेथे आले व क्रोधीत होऊन "तू मूषकरूप होशील" असा शाप दिला. गंधर्वाने शापवाणी ऐकताच तो घाबरला व उ:शाप मागू लागला. ऋषींना दया आली व त्याला उ:शाप दिला "तू पार्श्वाश्रमाजवळ राहशील व जेव्हां परमात्मा विनायक अवतार घेईल तेव्हां नित्य त्यांच्या चरणाजवळ वास करशील!". उ:शाप मिळवून गंधर्वाने प्रयाण केले व ऋषी भार्येसह आश्रमात परतले.
एकदा स्वर्गात नारद इंद्राला भेटायला इंद्रसभेत आले. त्यांनी इंद्राला सांगितले "भूतलावर अभिनंदन नावाचा राजा आहे. त्याने ब्राह्मणांना यज्ञयागात इंद्राला हविर्भाग देऊ नका असे सांगितले आहे." हे ऐकताच इंद्राला राग आला व त्याने काळशक्तीला आवाहन केले. तिच्या साहाय्याने त्याने विघ्नदैत्य निर्माण केला. विघ्नदैत्याने भूतलावर यज्ञयागाचा विध्वंस करण्यास सुरुवात केली. ब्राह्मण त्रासले व सर्व मिळून जगन्नाथाला शरण गेले. त्याची प्रार्थना केली. स्तुती केली. ते ऐकून देव प्रकट झाला व वरेण्य राजाच्या घरी अवतार घेऊन मी विघ्नदैत्याचा नाश करीन असे त्याने सांगितले" अशी अभयवाणी ऐकताच ब्राह्मण निश्चिन्त झाले.
विनायकाने वरेण्यराजाच्या घरी पुष्पिका राणीच्या पोटी जन्म घेतला. जन्मताच गजवदन असलेली व चतुर्भुज, सुनयन असलेली बालमूर्ती पाहताच पुष्पिका राणी घाबरली व तिने रडत रडत राजाला बोलावले. असे विचित्र बालक पाहताच राजाही घाबरला व त्याने बालकाला अरिष्ट समजून सैनिकांना सरोवरात सोडून देण्यास सांगितले. सैनिकांनी बालकास पाण्यात सोडून दिले. दुसरे दिवशी पार्श्वमुनी तळ्यावर स्नानास गेले असतांना त्यांना ते विचित्र बालक दिसले. पार्श्वमुनी प्रथम भयचकीत झाले पण नंतर सावध होऊन स्वतःशीच विचार करू लागले "कुणी अभाग्याने अरिष्ट समजून हे बालक या सरोवरात सोडून दिले खरे, पण मला मात्र हे जपतपाचे फळ द्यायला आलेले सुखदायक बालक वाटते आहे. असं वाटत आहे की अधर्माचा नाश करून धर्मस्थापनेसाठी परमात्म्यानेच अवतार घेतला आहे." ऋषींनी बालक आश्रमात नेऊन आपल्या पत्नीला दीपवत्सेला दाखवला. ती म्हणाली "हा बालक सूर्यासारखा तेजस्वी आहे. आपल्या तपाचे फळ देण्यासाठी प्रत्यक्ष विनायकच अवतरला आहे." पुत्रजन्माचा सोहळाच त्या दोघांनी अनुभवला.
विनायक त्या आश्रमातच वाढू लागला. इकडे सौभरीऋषींच्या शापाने तो गंधर्व तत्काळ मूषक झाला व पार्श्वमुनींच्या आश्रमात येऊन गुप्त रूपाने राहिला. त्याने आपल्या दातांनी जागोजागी खणले. यज्ञवेदिकेत बिळे केली. कुरतडून वृक्षही पाडले. यज्ञपात्रे चावून चावून खराब केली. या उपद्रवांनी पार्श्वमुनी त्रस्त झाले. विनायक जवळच खेळत होता. त्याने जवळच्या पाशाने मूषकाला जवळ ओढून आणले. मूषकाने विनायकाला मिळालेल्या शापाबद्दल व उ:शापाबद्दलही सांगितले व त्याच्या चरणांजवळ जागा मागितली. विनायकाने मूषकाला आनंदाने आपले वाहन म्हणून स्वीकारले व त्याच्यावर आरूढ झाला. पार्श्वमुनी विनायकाच्या या लीलेने आश्चर्यचकित झाले. विनायकाने विघ्नासुराचा वध करून, अधर्माचा नाश करून, धर्मस्थापनेचे कार्य करून देवांना सुखी करीन असे आश्वासन दिले.
पृथ्वीवरचे ब्राह्मण, ऋषी विघ्नासुराच्या त्रासाने भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने "पार्श्वमुनींच्या आश्रमातील विनायक या विघ्नासुराचा वध करील" असे सांगितले. सर्व ब्राह्मण ऋषी विनायकाच्या दर्शनाकरिता व पार्श्वमुनींना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले. सर्व वेदतुल्य ऋषी, ब्राह्मण एकत्र आलेले पाहून पार्श्वमुनींना आनंद झाला. त्यांचा योग्य तो आदरसत्कार करून त्यांनी सर्वांना एकत्र येण्याचे कारण विचारले. तितक्यात विनायकही तेथे आला. ऋषींनी येण्याचे कारण सांगितले व विघ्नासुराचा नाश करण्यास विनायकास विनविले. चतुर्भुज विनायक मूर्ती चारही हातात आयुधे घेऊन, मूषकावर आरूढ होऊन ब्राह्मणांसमवेत निघाली.
विनायकाने ब्राह्मणांना युद्ध पाहण्यास सांगून विघ्नासुरावर आपला अंकुश सोडला. तो अंकुश त्याच्या कंठाला लागून तो विनायकाजवळ खेचला गेला. त्याचे अक्राळविक्राळ रूप, भयानक दात-दाढा, लोंबणारी लांब लाल जिव्हा पाहून ऋषी चकीतच झाले.
तोच विघ्नासुराने जलरूप होऊन सर्व त्रैलोक्य व्यापले. विनायकाने ते सर्व जल प्राशन केले. विघ्नासुराने पक्ष्याचे रूप घेतले तर विनायकाने त्याच्यावर कमल सोडले. विघ्नासुराने अग्नीचे रूप घेऊन ब्रह्माण्ड जाळण्यास सुरुवात केली तो विनायकाने मेघ वर्षवून अग्नीस शांत केले. विघ्नासुराने वायूचे रूप घेऊन मेघांना पळवून लावले तर विनायकाने वायूस अडवण्यासाठी पर्वत निर्माण केले. दैत्य वज्ररूप झाला व त्याने सर्व पर्वतांचे चूर्ण केले. विनायकाने निर्वाणशक्ती सोडली. ती भक्षिण्यासाठी दैत्याने आपले मुख पसरले. ती सूर्यासारखी तेजस्वी क्रूर शक्ती पाहून दैत्याने आपले नेत्र झाकले व त्याचा सर्व गर्व उतरला. तो विनायकास शरण आला व त्याची स्तुती करू लागला. त्याची क्षमा मागू लागला. दैत्याची स्तुती ऐकून विनायकास संतोष झाला. तो म्हणाला "तूला मी ठार मारणार होतो, पण तू शरण आलास म्हणून मी तुला जीवदान देतो. परंतु माझे एक वचन तुला पाळले पाहिजे. जेथे जेथे माझे नामस्मरण चालू असेल, भक्तिभावाने पूजा होत असेल ते स्थान तू तत्काळ सोडले पाहिजेस" विघ्नासुराने मान्य करून विनायकास मागणे मागितले "तुझ्या नावाच्या आधी माझे नांव आले पाहिजे" विनायकाने त्याचे मागणे मान्य केले व विनायक "विघ्नेश्वर" या नांवाने ओळखला जाऊ लागला.
हे वर्तमान ऐकताच राजा वरेण्यही आपल्या पत्नीसह तेथे आला. विनायकाने त्यासही अनेक वर दिले. विघ्नेश्वराच्या नावाने विनायकाचा सर्वजण जयजयकार करीत असतानाच विनायक अंतर्धान पावला.
असा हा विनायकाचा विघ्नेश्वर अवतार अध्याय समाप्त!
विनायकाचा पाचवा अवतार - बल्लाळेश्वर (तसेच मयुरेश्वर) - अध्याय १३ ते १६
यात शंखासूर दैत्य व कमलासूर दैत्य यांनी वेदादि ग्रंथ नष्ट करून विद्येचा लोप केला. त्यावेळी विनायकाने दशभुज रूप धारण करून कमलासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. मयुरेश्वर क्षेत्राची स्थापना केली (मोरगाव).
दिव्य भीमकाय शरीर, दहा बाहु, भयानक रूप, पाश, अंकुश, परशु, कमळ, चक्र ही आयुधे उजव्या हातात, तर गदा, खङग, त्रिशूल, तोमर, डमरू ही आयुधे डाव्या हातात असे त्याचे स्वरूप आहे.
एकदा ब्रह्मदेव तपश्चर्येत मग्न असतांना शंखासूर दैत्य अचानक तेथे आला व त्याचे वेद, शास्त्रे, पुराण ग्रंथ त्याने चोरून नेले व सागरात ठेवले. ध्यान संपल्यावर ब्रह्मदेवांना जेव्हां हे समजले तेव्हा त्यांना फार दुःख झाले. हे शंखासुराचे कृत्य आहे हे त्यांना कळले. ते चिंतेत पडले. वेदशास्त्र पठण व ब्राह्मणांची नित्यनैमित्तिक कर्मे बंद झाली. ब्रह्मदेव क्षीरसागरी विष्णूंकडे गेले. तेथे श्री विष्णूंना योगनिद्रेत पाहून ते ही समस्या घेऊन कैलास पर्वतावर गेले. तेथे श्रीशंकरांना साष्टांग नमस्कार करून सर्व वृत्तांत सांगितला. श्री शंकर म्हणाले "योगनिद्रेतून बाहेर आल्यावर श्री विष्णू शंखासुराला मारतील व कमलासूराला मारण्यासाठी विनायक अवतार घेतील."
श्री ब्रह्मदेव स्वस्थानी परत गेले व ओंकाराचा एकाक्षरी मंत्र जपून त्यांनी विनायकास प्रसन्न करून घेतले. विनायकाने चारी वेद शास्त्रे पुराणे चोरणाऱ्या शंखासुराचे कृत्य मला कळले असून, त्याच्या बंधूचा कमलासूराचा मी वध करीन असे आश्वासन ब्रह्मदेवांना दिले. तसेच सर्व वेदादि ग्रंथ मी परत आणीन, ब्राह्मणांची नित्यनैमित्तिक कर्मे पूर्ववत सुरु होतील असे पाहीन व या करीता मी जो अवतार तो घेईन तो "मयुरेश्वर" या नावाने प्रसिद्ध होईल. असे बोलून विनायक अंतर्धान पावला.
पुढे विनायकाने स्वतःच्या मायेने पुन्हा वेदशास्त्रे पुराणे यांची निर्मिती केली. स्नान, संध्या, जप, हवन, स्वाध्याय, देवतार्चन, वैश्वदेव, अतिथीपूजन ही अष्टकर्मे लोप पावल्याने ब्राह्मण, ऋषी चिंतीत झाले होते. तोच त्यांच्या समोर विनायक ब्राह्मण रूपाने अत्यंत तेजस्वी रूप घेऊन उभा राहिला. त्याने त्यांची शास्त्रे पुराणे वेदादि ग्रंथ त्यांना परत केले व ब्राह्मणांना त्यांची नैमित्तिक कर्मे परत सुरु करण्यास सांगितले. ऋषी ब्राह्मणांस अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्या बल्लाळास आसनावर बसवून त्याचे पूजन स्तवन केले. पृथ्वीवर परत सर्व कर्मे यथासांग सुरु झाली.
दूतांकरवी हे वर्तमान कमलासूराला काळातच तो क्रोधीत झाला व शंखासुराच्या आज्ञेने प्रचंड सैन्यासह घोड्यावर बसून बल्लाळास (ब्राह्मणास) मारण्यासाठी निघाला. हे वृत्त ऐकताच ऋषी मुनी संतत्प झाले व त्यांनी बल्लाळास हे वृत्त कळवले. बल्लाळाने त्यांना शांत केले व स्वतःच प्रचंड सैन्य निर्माण केले व स्वतः दहा बाहुंचे भीमकाय शरीर प्रकट केले. दहा हातात दहा आयुधे होती. बल्लाळास व त्याच्या सेनेस बघून कमलासूर सेना भयकंपित झाली पण कमलासूराने त्यांना धीर दिला. घनघोर युद्ध झाले. कमलासूराने सर्पास्त्र सोडून सर्व बल्लालसैन्यामध्ये हा:हा:कार माजवला. कित्येक जण विषाग्निने मेले. उरले ते भीतीने पळू लागले. स्वतःच्या सैन्याची अशी दशा बघून बल्लाळाने रागाने स्वतःच्या बाणाने एक चक्र सोडले. त्यातून असंख्य चक्रे निर्माण झाली व त्याचे दैत्यसैन्य कुणाचे शीर, कुणाचे हातपाय तुटून बरेच जण धारातीर्थी पडले. ते पाहून कमलासूराने गदायुद्धाचे आव्हान बल्लाळास दिले. परंतु कमलासुराचे देवापुढे काही चालेना. शेवटी त्याने रणातून पलायन केले. बल्लाळ आश्रमात परत आला. स्वतःचे इतके सैन्य रणांत पडलेले पाहून प्रथम त्यास फार वाईट वाटले, पण ऋषींच्या प्रार्थनेनुसार त्याने संजीवनी मंत्र जपून पुन्हा आपल्या सैन्यास नवनवीन दिले. ऋषींनी बल्लाळास हवन करण्यास सांगितले. यज्ञाची सांगता होताच त्यातून मयूर उत्पन्न झाला. त्या मयूरावर विनायक आरूढ होऊन कमलासूराचा वध करण्यासाठी निघाला. मयूरावर बसला म्हणून त्याला "मयुरेश्वर" नाव पडले.
मयुरेश्वर-विनायक सिद्धी बुद्धीसहित रणांगणावर निघाला. बुद्धीने स्वतः कमलासूराला माशीसारखा मारीन, मला आज्ञा द्या अशी विनायकास प्रार्थना केली. विनायकाने आनंदाने ते मान्य केले. बुद्धी भयंकर देह धारण करून व मायेने प्रचंड सैन्य निर्माण करून ती रणांगणावर पोहोचली. पण कमलासूर व त्याच्या सैन्यापुढे तिचा टिकाव लागेना. तिने पुन्हा सैन्य निर्माण केले. पण तेही पराजित होऊ लागले. शेवटी बुद्धीने "लाभ" नामक मानसपुत्र निर्माण केला. तो धनुर्विद्या निपुण होता. बुद्धीला विचारून ऋषींच्या आश्रमात जाऊन मयूरावर आरूढ झालेल्या आपल्या पित्याचे विनायकाचे दर्शन घेऊन तो युद्धास निघाला.
तो कोवळा कुमार पाहून कमलासूर प्रथम उपहासाने हसला व त्याला स्वगृही परत जाण्यास, पण तोपर्यंत लाभाने कमलासुराचे असंख्य सैनिक मारले. कमलासूराने मोहिनी अस्त्राचा मंत्र जपून लाभाच्या सैन्याला मोहनिद्रेत नेले. एकटा लाभ व विनायक सोडून सर्व सैन्य मोहनिद्रेत गेले. विनायकानेही लाभाची परीक्षा घेण्यासाठी मोहनिद्रेत गेल्याचे नाटक केले. लाभ शोकाकुल झाला. पण त्याला हे संकट दूर करण्याची युक्ती आठवली. त्याने मोहिनीअस्त्राचा संहार करणारा मंत्र जपून मोहनिद्रेत गेलेल्या सैन्यास उठवले. पण विनायक काही उठला नाही. ते पाहून लाभ अत्यंत दुःखी झाला व त्याने आत्मदहन करण्याचे ठरवले. त्याने सैनिकांकडून लगेच काष्ठे जाणवली व त्यास अग्नी लावून चितेत उडी मारणार तोच विनायकाने आपले नाटक संपवून लाभास आवरले. लाभाला अत्यंत आनंद झाला. नंतर विनायक मयूरावर बसून प्रचंड सैन्यासह परत कमलासुरावर चाल करून गेला.
विनायकाने विशाल रूप धारण केले. त्याचे मस्तक आकाशापर्यंत उंच पोहोचले. ते पाहून कमलासूराने त्याची निर्भत्सना करण्यास सुरुवात केली. तेव्हा क्रोधीत होऊन विनायक म्हणाला "एका नेत्रकटाक्षात पूर्ण त्रैलोक्याचा मी संहार करीन. तुझ्यासारखे दैत्य मरण्यासाठीच माझा अवतार झाला आहे." दोघांत घनघोर युद्ध झाले. कमलासूर देवासमोर उभा न राहता सैन्यात शिरला व बाणाने अनेक शूरवीर मारले. ते पाहून लाभ धावून आला व कमलासुरावर मुष्टिप्रहार केला. कमलासूराने आकाशात उड्डाण केले व शुक्राचार्यांनी दिलेला मंत्र जपून योगसामर्थ्याने आकाशातच राहिला. तेथून त्याने बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. विनायकाने पाश टाकून कमलासूरास आपल्यासमोर आणले. दैत्याने केलेल्या गदेचा प्रहार मोडून काढत त्याने कमलासुरावर अमोघ शास्त्रे सोडली व त्यास मारले. पण जेथे जेथे कमलासुराचे रक्त सांडे तेथे तेथे परत प्रति कमलासूर उत्पन्न होई. ते पाहून देवाच्या साहाय्यासाठी सिद्धी बुद्धी त्वरित धावून आल्या. त्यांनी आपल्या सामर्थ्याने दहा हजार किरात निर्माण केले व शत्रुसैन्यावर सोडले. शत्रुसैन्यात हा:हा:कार माजला. ते सैरावरा पळू लागले. सिद्धीबुद्धीने नवकोटी भूतगण निर्माण केले व दैत्यसैन्यास भक्षिण्यास सांगितले. भूतगण दैत्यसैन्यास भक्षू लागले. त्यांनी प्रति कमलासुरांचेही भक्षण करण्यास सुरुवात केली. रणांगण पूर्ण रिकामे झाले. कमलासूराचा रक्तबिंदू पडतांना दिसताच तो जमिनीवर पडण्याआधीच भूतगणाने वरच्यावर चारण्यास सुरुवात केली. शेवटी एकटा कमलासूर रणांगणात उरला. तरीही त्याने धीर सोडला नाही. दोघांत घनघोर युद्ध झाले. सरतेशेवटी विनायकाने त्रिशुळाने आघात करून कमलासुराच्या देहाचे तीन तुकडे केले. जेथे कमलासुराचे शीर पडले तेथे विनायकाने आपले क्षेत्र निर्माण केले.
कमलासूराचा वध झालेला पाहून सर्व देवांना आनंद झाला. सर्व देवादिकांनी विनायकाची पूजा केली. पूजा करीत असताना नकळत ब्रह्मदेवाचा कमंडलू कलंडला व तेथे नदी निर्माण झाली. तिला कमंडलू तीर्थ म्हणतात.
ते स्थान त्या दिवसापासून "मोरगाव" क्षेत्र म्हणून विख्यात झाले व विनायक मयुरेश्वर नांवाने प्रसिद्ध झाला.
ध्रुमकेतु - विनायकाच्या सहाव्या अवताराची कथा :-
या अवतारात विनायकाने धुमदैत्याला ठार मारले. त्याने आपले विशाल मुख उघडून सैन्यासहित धुमदैत्याला गिळून टाकले. रक्तवर्ण अंगकांतीचा, शुभ्रवस्त्र परिधान केलेला, चतुर्बाहु, त्रिनयन, मस्तकावर किरीट-कुंडले धारण केलेला, दिव्य कांतीचा, कमल, परशु, मोदक, मुक्तामाला, वनमाला हाती धारण केलेला, शुण्डाधारी, एकदंत, शूर्पकर्ण, विशालनेत्र असे त्याचे स्वरूप आहे.
पूर्वी विंध्याचल प्रांतात महीपार्वती नगरात धुमदैत्यराजा राज्य करीत होता. आपल्या पराक्रमाने त्याने सर्व देवांना व राक्षसांना जिंकले होते. तो काळ्या वर्णाचा, दांतही काळे असलेला असा दैत्यराज होता. त्याचा पूर्ण त्रैलोक्यात दरारा होता. त्याच्या राज्याचे आठ प्रधान होते. सर्वच पराक्रमी होते. चार शूर बलवान पुत्र होते व सुंदर अशी पट्टराणी होती. राज्य धनधान्य संपत्तीने समृद्ध होते. हा धूम्रदैत्य शंकराचा भक्त होता. दिवसरात्र हा श्री शंकराच्या आराधनेत मग्न असे.
एकदा तो आपल्या सभामंडपात, आपल्या पुत्रांसमवेत व प्रधानासमवेत बसला असता भृगुऋषी तेथे आले. अचानक भृगुऋषींना आलेले पाहताच दैत्यराजाला आनंद झाला. त्याने भृगुऋषींना आपल्या सिंहासनावर बसवून त्यांचे यथाविधी पूजन केले. भृगुऋषींना समाधान वाटले. त्यांनी आश्रमात जाण्यासाठी निरोप घेतला. तेव्हां राजाने त्यांना विचारले "मी गेल्या जन्मी असे कोणते सत्कर्म केले होते की या जन्मी धनधान्य संपत्तीने समृद्ध असलेल्या नगरावर मी राज्य करतो आहे. मला सुशील पत्नी व शूर आज्ञाधारक असे चार पुत्र आहेत. दैत्य असूनही मला श्री शंकरांचीच भक्ती करावीशी वाटते ते कां?"
भृगुऋषींनी उत्तर दिले "गेल्या जन्मी तूं विकृती नामक राजा होतास. अत्यंत पराक्रमी होतास. तसेच सत्यशील, सद्गुणी, परमेश्वराचा भक्त होतास. तू ऋषींच्या परवानगीने नव्याण्णव यज्ञ केलेस. ते पाहून इंद्राला राग आला व त्याने नारदाला शंभराव्या यज्ञात विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवले. नारदाने विप्रवेष धारण करून त्याच्याकडे विचित्र दान मागितले व ते न दिल्याने नारदाने त्याला शाप देऊन त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला. राजाला आपला शंभरावा यज्ञ पूर्ण करता आला नाही. नव्याण्णव यज्ञ केल्याच्या प्रभावाने त्याला वैभव प्राप्त झाले. पण नारदाच्या शापाने त्याचा दैत्यकुळात जन्म झाला. अशी पूर्वजन्माची कथा सांगून भृगु ऋषी निघून गेले.
ज्या नगरात धुमदैत्य राज्य करीत होता त्याच नगरात माधव नावाचा श्रीमंत गुणवान ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुमदा होते. ती पतिव्रता होती. त्या दोघांना मुलबाळ नव्हते म्हणून दोघेही दुःखी होते. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण ते सर्व व्यर्थ ठरले!
माधवास अत्यंत राग आला. अविचाराने तो पत्नीस म्हणाला, तू वंध्या आहेस. तुझे तोंडही बघायची माझी इच्छा नाही. सुमदेला दुःख झाले. तिने घर सोडले व निर्बीड अरण्यात गेली. तेथे फिरणाऱ्या क्रूर पशूंची पर्वा न करता तिने तपश्चर्येला सुरुवात केली व विष्णूचा जप करण्यास सुरुवात केली. बारा वर्षे निराहार राहून रात्रंदिवस जप केल्यावर विष्णूने प्रसन्न होऊन तिला सगुण रूपांत दर्शन दिले. सुमदेने आपले दुःख त्याला सांगितले. विष्णूने "मीच तुझ्या पोटी जन्म घेईन" असे सांगून तो अंतर्धान पावला. सुमदा परत आपल्या नगरात परतली. तपश्चर्येने तेजस्वी झालेली सुमदा पाहून नगरातील लोकांना आश्चर्य वाटले. ते तिची विचारपूस करू लागले. ही वार्ता धुमराजालाही कळली. तो सैन्यासह तेथे आला. दिव्यकांतीची, दाही दिशांना जिचे तेज व्यापले आहे अशा सुमदेला बघून तोही आश्चर्यचकित झाला. त्याने वस्त्रालंकार देऊन तिचा गौरव केला. दिव्य यान पाठवून माधवास आणले. मग दोघांना त्या यानात बसवून त्यांच्या घरी पाठवले.
घरी आल्यावर सुमदेने सर्व वृत्तांत माधवाला कथन केला. श्री विष्णूंनी दिलेले वरदान ऐकून माधवाला फार आनंद झाला. पुढे काही दिवस गेल्यावर सुमदा गर्भवती झाली. दोघांना आनंद झाला. ते आपला सर्व वेळ धर्माचरणात घालवू लागले.
इकडे शरद ऋतू येताच धूम्रदैत्य आपले पुत्र, अमात्य व प्रचंड सैन्य घेऊन विजय प्राप्त करण्यास निघाला. वाटेत आकाशवाणी झाली "सुमदेपोटी जो पुत्र होईल तो धुमाला ठार मारेल." ही आकाशवाणी ऐकून धूम्रदैत्य बेशुद्ध झाला. पुत्रांनी व प्रधानांनी त्याला परत राजवाड्यात आणले.
शुद्धीवर आल्यावर धूम्रदैत्याला आकाशवाणीचे स्मरण झाले. तो भयाने पछाडला व भयभीत झालेल्या दैत्याने मृत्यू टाळण्यासाठी काय करावे यासाठी सभा बोलावली. सभेमध्ये त्याचे आठही प्रधान व चार पुत्र होते.
प्रधानांनी आपापली मते दैत्याला ऐकवली. कुणी म्हणे, मृत्यूचे भय बाळगू नये, कुणी म्हणे सुमदेला न मारता फक्त तिच्या बाळास मारावे. कुणी सांगितले स्वतः विष्णू सुमदेच्या उदरी जन्म घेणार आहे तेव्हां तो पुत्र आधी पहावा, त्याच्याकडे सूक्ष्म दृष्टीने पहावे, त्याच्याशी बोलून बघावे. एका प्रधानाने सांगितले शत्रूला मारणे हे पाप ठरत नाही, तर एका प्रधानाने कपटाने शत्रूचा नाश करावा असे सुचवले. दैत्याच्या मुलांनी सुमदेला तिच्या गर्भासहीत आत्ताच मारावे नाहीतर अनर्थ होईल असेही सांगितले. सर्वांची चांगली वाईट मते ऐकून दैत्यराजाने सभा विसर्जन केली व खेदाने तो उठून गेला.
धुमदैत्याने अखेर सुमदेला गर्भासहीत मारण्याचे ठरवले व विद्रुम नावाच्या आपल्या प्रधानाला मध्यरात्री पाचशे सैनिक घेऊन माधवाच्या घरी धाडले. विद्रुम माधवाच्या घरी आला व त्याने गृहद्वार फोडून घरात प्रवेश केला. त्याच्या सैनिकांनी गाढ सुखनिद्रेत असलेल्या सुमदा व माधवला त्यांच्या मंचकासहीत उचलले व घोर अरण्यात आणले. सुमदेला मारणे त्याला अनुचित वाटले पण राजाची आज्ञा पाळणे भाग होते.
इतक्यात सुमदेला जाग आली. तिने पाहिले हे आपले घर नसून आपण निर्बीड अरण्यात आहोत. तिने घाबरून माधवास उठवले. दोघांनी आपल्या सभोवताली असलेल्या विद्रुमाच्या सैनिकांना व विद्रुमास पाहिले व अरण्यात आणण्याचे कारण विचारले. विद्रुमाने तिला दैत्याने ऐकलेली आकाशवाणी सांगितली व राजाज्ञेने तुला गर्भासहीत मारण्यास मी आलो आहे. सुमदेने, अपराध नसतांना मारणे हे पाप आहे, तेव्हां तूं राजाला सुमदेला मारली असे खोटें सांग. चांगल्या कामाकरता खोटे बोलणे पाप ठरत नाही, असे विद्रुमाला विनवले. शेवटी तू ऐकले नाहीस तर शाप देऊन तुझे तात्काळ भस्म करीन असेही धमकावले. पण विद्रुमाने तिचे ऐकले नाही.
शेवटी हताश होऊन तिने विष्णूचा धावा सुरु केला. तिच्या विष्णुस्मरणाच्या प्रभावाने अनेक अक्राळ विक्राळ हातात शस्त्रे घेतलेले भयंकर वीर निर्माण झाले. त्यांच्या सिंहगर्जनेने आभाळ व्यापले. ते अक्राळ विक्राळ भयंकर सैन्य पाहून विद्रुमाचे सैन्य घाबरून पळू लागले. स्वतः विद्रुमाने घाबरून पलायन केले व तो राजसदनात परत आला.
विद्रुमाचा पराभव झाला हे दैत्यराजाला हेरांकरवी समजले. तो अत्यंत क्रोधीत झाला व मान खाली घालून उभा असलेल्या विद्रुमाला त्याने आपल्या खड्गाने ठार मारले. सन् नावाच्या अमात्याने ते पाहून धुमदैत्यास सांगितले "सुमदे भोवती चोवीस तास सर्व विश्वासू सैनिकांचा पहारा ठेवा व बालक जन्माला आले की लगेच त्याला ठार मारावे. हे ऐकून धुमदैत्याला अतिशय आनंद झाला. तो सन्ला म्हणाला तूंच हे कार्य गुप्तपणे कर. धुमदैत्याच्या आज्ञेवरून सन् अमात्याने अरण्याच्या चारही वाटा रोखल्या. पूर्व - पश्चिम दिशांचे सैन्यासहित तो स्वतः रक्षण करीत होता. दक्षिण उत्तर दिशांना त्याने त्याचे विश्वासू सैनिक ठेवले. ते सर्वजण बालकाचा जन्म होताच त्याला मारण्यासाठी जागृत होते. माधव-सुमदा दुःखमग्न अवस्थेत कंदमुळे भक्षण करून राहत होते.
नऊ मास भरतांच सुमदा प्रसूत झाली व तिने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. रक्तासारखी लाल अंगकांती असलेला, मुक्तिमाला धारण केलेला, श्वेत वस्त्र परिधान केलेला, चार बाहू असलेला, हातात कमल, परशु, मोदक, मुक्तामाला ही आयुधे, शुण्डाधारी, एकदंत, कानात कुंडले, डोक्यावर मुकुट, असे हे दैदिप्यमान बालक जन्माला आले. सुमदेला वर मिळाल्याप्रमाणे विष्णुरूपाने तिच्या पोटी विनायक जन्मला. माधव-सुमदेला अत्यंत आनंद झाला. "इहलोकी सुख भोगून अंती मोक्ष पावाल" असे वरदान विनायकाने दोघांना दिले. "आता मी धुमदैत्याला ठार मारतो" असे बालकाचे भाषण ऐकतांच सुमदा शंकित झाली. हे कळतांच विनायक धरणीवर निश्चेष्ट पडला. ते पहाताच सुमदा घाबरली व त्याच्या मुखाकडे पाहू लागली. तो तिने त्याच्या मुखात अष्टवसू, इंद्रादी देव, चौदा भुवने, पर्वत, नद्या पाहिल्या. तिचा संशय निवळला. मोठ्या प्रेमाने तिने देवाला स्तनपान दिले. त्याने तृप्ती न होता बालक मोठ्याने रडू लागले. बालकाचे रुदन ऐकून पहारा ठेवून असलेले सर्व रक्षक धावले व त्यांनी सुमदे भोवती वेढा घातला. पण ते तेजपूर्ण, अलौकिक बालक पहाताच सर्वजण घाबरले व ओरडत, धावत, अडखळत, पडत कसेतरी दैत्यराजाकडे पोहोचले व ही जन्माची वार्ता त्यांनी दैत्यराजाला सांगितली.
प्रथम ती वार्ता ऐकून धुमदैत्य मूर्च्छित झाला. परंतु नंतर सावध होऊन आवेशाने हातात शस्त्रास्त्रे घेऊन सिंहगर्जना करीत निघाला. तो अरण्यात वेगाने पोहोचला. सुमदेच्या बाळाकडे त्याने रागाने पाहिले. पण तो भयकंपितही झाला. त्याने तीक्ष्ण शस्त्र हातात घेऊन अचूक नेम धरला, तोच सुमदेचा बालक गगनापर्यंत वाढला व त्याने आपले विशाल मुख उघडले व धुमदैत्याला, त्याच्या प्रधाना आणि सैन्यासहित गिळून टाकले. धुमदैत्याचा विनायकाने नाश केल्यावर देवादिकांनी स्वर्गातून विनायकावर पुष्पवृष्टी केली. त्याच्या जयजयकाराने दशदिशा दुमदुमल्या. सगळीकडे आनंदीआनंद झाला. ब्राह्मणांनी, ऋषींनी धावत येऊन विनायकाचे पूजन व स्तवन केले. अशातऱ्हेने धूमाचे हनन करून विनायकाने त्रैलोक्याला सुखी केले. धुमाचे हनन केले म्हणून विनायकाचे नांव धूमकेतू पडले. आपले कार्य करून विनायक अंतर्धान पावला.
अशातऱ्हेने विनायकाचा धूमकेतू अवतार संपन्न झाला!
गणपतीच्या ३२ मूर्ती
१. बाळ गणपती - लहान बांधा असलेलं, लहान मुलासारखं हे रूप आहे. म्हणून ह्याला बाळ-गणपती असं नाव आहे. हे रूप चतुर्भुज आहे. चेहरा हत्तीचा आहे. रंग सूर्योदयाच्या वेळेचा लालसर आहे. हातांमध्ये - केळी, आंबा, फणस, ऊसाचा तुकडा आणि सोंडेमध्ये मोदक.
२. तरुण गणपती - हे गणपतीचं यौवन रूप आहे. हे रूप अष्टभुज आहे. चेहरा हत्तीचा. हातांमध्ये - पाश, अंकुश, मोदक, कवठ, जांभूळ, तुटलेला दात, ऊसाचा तुकडा, भाताचा तुरा. रंग दुपारच्या सूर्याप्रमाणे लाल.
३. भक्ती गणपती - भक्तांचा गणपती म्हणून ह्याला भक्ती गणपती असे नाव आहे. रंग शरद ऋतूच्या पांढऱ्या ढगासारखा. चतुर्भुज. चेहरा हत्तीचा. हातांमध्ये - खोबरं, आंबा, केळी आणि खिरीचं भांडं.
४. वीर गणपती - हातांमध्ये - वेताची छडी, धनुष्य, बाण, भाला, चक्र, तलवार, ढाल, चाबूक, गदा, अंकुश, नाग, त्रिशूल, कुदळ, इत्यादी. १६ अस्त्र १६ हातांमध्ये. रंग लालसर. चेहरा रागीट. हातात वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी.
५. शक्ती गणपती - रंग शेंदुरी. हिरव्या रंगाच्या देवीला आलिंगन देत आहे असं हे रूप आहे. एक हात अभय मुद्रा दाखवतआहे. उरलेल्या हातांत पाश, अंकुश आणि फुलांचा हार.
६. द्विज गणपती - चार हात आणि चार मुखं असलेलं हे रूप आहे. हातांमध्ये - पुस्तक, अक्षमाला, दंड आणि कमंडलु आहे. दोन हातांमध्ये विजेसारखे चमकणारे कडे. रंग चंद्रासारखा पांढरा.
७. सिद्धी गणपती - चार हात आणि सोंड. चार हातांमध्ये - आंबा, फुलांचा गुच्छ, ऊसाचा तुकडा आणि परशु. ह्या गणपतीच्या रुपाला तिळाचा लाडू खूप आवडतो. रंग सोन्यासारखा चमकणारा आणि हिरवी छटा.
८. उच्छिष्ट गणपती - ह्या रुपाला सहा हात आहेत. हातांमध्ये डाळिंब, वीणा, भाताचा तुरा, अक्षमाला, नीलकमळ, गुंजेची बोरं. रंग निळा.
९. विघ्न गणपती - हे अष्टभुज रूप आहे. हातांमध्ये शंख, ऊसाचा धनुष्य, पुष्पबाण, कुऱ्हाड, पाश, चक्र, फुलांचा गुच्छ, बाण. रंग सोन्याचा. भरपूर अलंकार.
१०. क्षिप्र गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. नावाप्रमाणे त्वरित पावणारा (क्षिप्र). रंग लालसर. दिसायला सुंदर. हातांमध्ये - अंकुश, पाश, दंत, कर्पग कुडी. सोंडेच्या टोकावर रत्नकलश.
११. हेरंब गणपती - हे पाच मुखांचं आणि दशभुज असं रूप आहे. एक हात अभय मुद्रा आणि एक हात वरद मुद्रा. उरलेल्या हातांमध्ये - पाश, दंत, अक्षमाला, माळ, परशु, चाबूक, मोदक, फळ. रंग गडद हिरवा. वाहन - सिंह
१२. लक्ष्मी गणपती - हे अष्टभुज रूप आहे. हातांमध्ये - पोपट, डाळिंब, कलश, अंकुश, पाश, कर्पग कुडी, खड्ग, वरद हस्त. रंग अमृताच्या प्रवाहासारखा पांढरा. बाजूला दोन देवी - रिद्धी सिद्धी
१३. महागणपती - हे दशभुज रूप आहे. हातांमध्ये - डाळिंब, गदा, ऊस, धनुष्य, चक्र, कमळ, पाश, नीलकमळ, भाताचा तुरा, दंत. सोंडेच्या टोकावर रत्नकलश. रंग सकाळचा लाल रंगाचा सूर्यकिरण. तीन डोळे. डोक्यावरती चंद्र कला. मांडीवर देवी आणि देवीच्या हातात कमळ. एकमेकाला आलिंगन दिले आहे.
१४. विजय गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, आंबा. मूषक वाहन. रंग लालसर.
१५. नृत्य गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. बोटामध्ये अंगठ्या. हातांमध्ये - पाश, अंकुश, कुऱ्हाड, दंत वगैरे. रंग सोन्याचा. कल्पवृक्षाच्या खाली विराजमान.
१६. ऊर्ध्व गणपती - हे अष्टभुज रूप आहे. हातांमध्ये - निळ्या रंगाचे फुल, भाताचा तुरा, कमळ, कल्हार, ऊसाचा धनुष्य, बाण, दंत आणि शेवटच्या हाताने देवीला आलिंगन दिले आहे. रंग चमकणारा सोनेरी आणि हिरवी छटा.
१७. एकाक्षर गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. रंग लाल. लाल रंगाचं सोवळं नेसले आहे. लाल रंगाचा फुलांचा हार. कपाळावर चंद्रकोर. त्रिनेत्र. हाताची लांबी कमी. पाय लहान. हातांमध्ये - डाळिंब, पाश, अंकुश आणि वरदहस्त. हत्तीचा चेहरा. पद्मासन घालून बसलेले आहेत. वाहन मूषक.
१८. वर गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. रंग लाल. त्रिनेत्र. हातांमध्ये - पाश, अंकुश, मधाने भरलेले पात्र, मानवी कवटीचा खालचा भाग. डोक्यावर चंद्रकोर.
१९. त्र्याक्षर गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. कान हलतात (चामरासारखे). रंग सोन्यासारखा. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, आंबा. सोंडेच्या टोकाला मोदक.
२०. क्षिप्रप्रसाद गणपती - हे षडभुज रूप आहे. त्वरित प्रसाद देणारा. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, कल्पलता, कमळ, लिंबू धारण केले आहे. अलंकार घातलेले आहेत. पोट मोठे आहे. वेगळ्या प्रकारची गदा पण धारण केली आहे.
२१. हरिद्रा गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. रंग पिवळा. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, मोदक. भक्तांना अभय देणारे.
२२. एकदंत गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. पोट मोठे (पेटाऱ्या सारखे). रंग निळा. हातांमध्ये - कुऱ्हाड, अक्षमाला, लाडू, दंत.
२३. सृष्टी गणपती - मूषकावर आरूढ झालेलं चतुर्भुज रूप आहे. रंग लाल. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, आंबा.
२४. उदंड गणपती - हे बारा हातांचं रूप आहे. रंग लाल. हातांमध्ये - नीलकमळ, डाळिंब, गदा, दंत, ऊसाचा धनुष्य, रत्नकलश, पाश, अंकुश, भाताचा तुरा, हार (रत्नहार), कमंडलू आणि शंख. हिरव्या रंगाची देवी डाव्या मांडीवर बसली आहे. तिच्या हातामध्ये कमळ आहे. तिला आलिंगन दिले आहे.
२५. ऋणमोचन गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. हातांमध्ये - पाश, अंकुश, दंत, जांभूळ. रंग स्फटिकासारखा पांढरा. लाल रंगाचं सोवळं.
२६. धुंडी गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. हातांमध्ये - अक्षमाला, कुऱ्हाड, रत्नकलश, दंत. रंग लाल.
२७. द्विमुख गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. हातांमध्ये - दंत, पाश, अंकुश, रत्नकलश. रंग फिका निळा. रत्नाचा मुकुट धारण केला आहे. लाल रंगाचं सोवळं. दोन मुखं आहेत.
२८. त्रिमुख गणपती - ह्या रुपाला तीन मुखं आहेत. उजव्या बाजूच्या हातांमध्ये अंकुश, अक्षमाला, वरदहस्त. डाव्या बाजूच्या हातांमध्ये पाश, अमृताचा कलश, अभयहस्त. कमळाच्या आसनावर बसलेले आहेत. रंग लाल.
२९. सिंह गणपती - हे अष्टभुज रूप आहे. उजव्या बाजूच्या हातांमध्ये - वीणा, कल्पवृक्षलता, चक्र, वरदहस्त. डाव्या बाजूच्या हातांमध्ये - कमळ, रत्नकलश, फुलांचा गुच्छ, अभयहस्त. रंग पांढरा. वाहन सिंह.
३०. योग गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. योगमुद्रा आसन. रंग - कोवळ्या सूर्याच्या किरणासारखा. वस्त्र - इंद्रनील रंगाचं वस्त्र धारण केलं आहे. हातांमध्ये - पाश, अक्षमाला, योगदंड, ऊस.
३१. दुर्गा गणपती - हे अष्टभुज रूप आहे. रंग - सोन्याला तापवल्यावर जो रंग येतो तो. स्थूल शरीर. उजव्या बाजूच्या हातांमध्ये - अंकुश, बाण, अक्षमाला, दंत. डाव्या बाजूच्या हातांमध्ये - पाश, धनुष्य, वेल, जांभूळ. लाल रंगाचं वस्त्र.
३२. संकटहर गणपती - हे चतुर्भुज रूप आहे. रंग सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखा. डाव्या बाजूला - हिरवा रंग असलेली देवी. जिच्या हातात निळ्या रंगाचे फुल आहे. ती डाव्या मांडीवर बसली आहे. डाव्या बाजूच्या हातांमध्ये - पाश, खिरीची वाटी. उजव्या बाजूच्या हातांमध्ये -अंकुश, वरदमुद्रा. लाल कमळावरती उभे आहेत. निळ्या रंगाचे वस्त्र धारण केले आहे.




































.jpg)
























































,_thangka_-_Sichuan_University_Museum_-_Chengdu,_China_-_DSC06191.jpg)
























































No comments:
Post a Comment