प्राचिनकाळी मालवण बंदर, आचरा बंदर या ठिकाणी उतरणारा माल अनेक मार्गांनी घाटावरील बाजारपेठात जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी त्याकाळी मोक्याच्या जागी किल्ले बांधण्यात आले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सिध्दगड हा किल्ला मालवण, आचरा बंदरहून घाटमाथ्यावरील आजरा या बाजारपेठेकडे जाणार्या मार्गावरील घोटगीच्या घाटावर व कसाल नदीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.
या गडाच्या इतिहासात डोकावल्यास सावंतवाडीच्या खेमसावंत यांनी पेशव्यांना सन १७४२ मध्ये लिहीलेल्या पत्राचा संदर्भ घेतल्यास हा गड सावंतानी बांधला असावा. "सिधगड आम्ही पुरातन कुडाळ प्रांतामध्ये बांधला.तुळाजी आंगरे याणी दगा करुन घेतला.उभयता घर कलह लागला.तेव्हा सहजच तुळाजी आंगरे याजपाशी राहीला.हली सरकारात घेतला आहे.आम्हाकडील लोकांनी घेतला आहे.तो आम्हाकडेच द्यावा".
आंग्रे व सावंत यांच्यात सुरवातीपासूनच वैर होते.त्यात तुळाजी व नानासाहेब पेशवे यांचे पटेना.यामध्ये दोघांंनी एकमेकाच्या मुलुखावर चढाई सूरु केली.त्यात सावंत व करवीरकर यांच्यातही वितुष्ट निर्माण झाले.करवीरकर व सावंत यांच्या वादात पेशवे आपल्याला सहाय्य करतील या कल्पनेने सावंतांनी पेशव्यांची बाजु घेउन आंग्रेबरोबर युध्द सुरु केले.यात १७४८ -४९ मध्ये तुळाजी आंग्रेंनी सावंताच्या मुलुखावर चढाई करीत सिध्दगडावर हल्ला केला आणि तो ताब्यात घेतला.हे बघून सावंतानी पेशव्यांना पत्र लिहीले "आम्ही सदाशिवपंत यांचे दर्शनास गेलो,ते प्रसंगी मागे ( आंग्रेनी ) सिध्दगड त्वाही घेतला. आम्ही भरतगड ( परत ) घेतला.सिधगड आंग्रे यांकडे राहीला आहे. ते मुलकात धामधुम करायास चुकत नाहीत. शिबंदी ठेवली".सांवतांचे तोकडे सैन्य पहाता ते आंग्यांचा मुकाबला करु शकणार नाहीत हे लक्षात घेउन पेशव्यांनी सावंताच्या मदतीला कुमक धाडली होतीच. नानासाहेब पेशव्यांनी सन १७५५ मध्ये तुळाजी आंग्रे यांच्याविरुध्द मोहीम उघडली. पेशव्यांनी परक्या ईंग्रजांची मदत घेउन तुळाजी आंग्रे यांचे आरमार म्हणजे खरतर मराठ्यांचे आरमार विजयदुर्गांच्या साक्षीने बुडवले.यावेळी सिध्दगड तुळाजींकडे होता. पेशव्यांचे सैन्य खंडोजी मानकर व कृष्णाजी महादेव यांच्या नेतृत्वाखाली सिध्दगडावर चालून आले.सोबत सावंतांचे सैन्य होतेच.सिध्दगडाला पक्का वेढा बसला आणि फेब्रुवारी १७५६ मध्ये सिद्धगड पेशव्यांच्या ताब्यात आला.मात्र तुळाजी आंग्रांचे पारिपत्य करुन मोहीम संपली तरी सिध्दगड काही पेशव्यांनी सावंताना दिला नाही.हे पाहून खेम सावंतांनी सन १७४२ मध्ये पेशव्यांना पत्र लिहीले " सिधगड आम्ही पुरातन कुडाळ प्रांतामध्ये बांधला.तुळाजी आंगरे याणी दगा करुन घेतला.उभयता घर कलह लागला.तेव्हा सहजच तुळाजी आंगरे याजपाशी राहीला.हली सरकारात घेतला आहे.आम्हाकडील लोकांनी घेतला आहे.तो आम्हाकडेच द्यावा".

अर्थात पेशव्यांनी सावंताच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.पेशव्यांच्या सैन्याशी लढून सिध्दगड मिळवणे अशक्य असल्याचे लक्षात घेउन सावंतांनी महादजी शिंदे यांच्या मातोश्री निंबाबाई यांना मध्यस्थी करण्यास सांगून सिध्दगड आपल्याला मिळवून देण्याची गळ घातली.निंबाबाई यांनी नानासाहेब व भाउसाहेब यांना विनंती केली "सिध्दगड व सालसी सावंतवाडीकर यांना परत करावे. सावंत यांचा सिदगड व सालसी त्यांचा मुलुख त्यांना परत द्यावा". अखेर पेशव्यांनी सावंतांचा मुलुख त्यांना दिला.
विशेष म्हणजे हाच सिध्दगड सावंतांना पुढे स्वखुषीने पेशव्यांना द्यावा लागला.त्याचे झाले असे सन १७७७-७८ मध्ये करवीरकरांनी सावंतांवर स्वारी केली.करवीरकरांना सिध्दगड मिळू नये यासाठी सिध्दगड पेशव्यांनी आपल्या ताब्यात घ्यावा यासाठी २६ मार्च १७८८ रोजीच्या पत्रात गंगाधर गोविउंद लिहीतात, "महाराज करवीरकरांनी सावंतांचे नरसिंहगड व भरतगड घेतले.ते समई सिदगडाचे सुत्र आम्हाकडे आले.त्यावरुन सरकारचे ( म्हणजे पेशव्यांचे ) निशाण पाठवून किल्ल्याचा बंदोबस्त केला. त्यास सिदगड किल्ला हा तालुके विजयदुर्गाच्या सरहदेवर आहे.वास्तव लोक पाहिजेत त्यास नामजद पाठवावे अगर जदीद ठेवावयाची आज्ञा असावी व महाराजाकडील कोणी बोलावयासी येणार आहे.".
यावर बालाजी जनार्दनानी गंगाधर यांना लिहीले "सिदगडावर निशाण चढवून बंदोबस्त केला व आरमार स्वारीस रवाना केले उत्तम आहे.लोक तुर्त नामजद ( गडावर ) पाठवावयाचे नाहीत व जदीदही ठेवू नयेत.महाराजांकडील बोलाववयास येणार आहे तो आल्यावर बोलण्याचा मजकूर लिहून पाठवावा समजोन उत्तर जाईल.त्याप्रमाणे करावे. उभयताकडून ( करवीर व सावंत ) सरकार तालुकियास कोणेविसी उपद्रव होणार नाही ते पहावे".
यावेळी मात्र पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतलेला सिध्दगड करवीरकरांच्या फौजा माघारी फिरताच सावंतांना परत केला.मात्र पुढे पेशवे -सावंत असा संघर्ष निर्माण झाला.पेशव्यांनी सावंताच्या विरुध्द कुडाळच्या नारायण प्रभुंच्या मदतीस नारो त्रिंबक यांना पाठवून दिले.त्यांनी सिध्दगडावर हल्ला करुन तो घेतला.सावंताना पुन्हा एकदा सिध्दगड लढून जिंकणे अशक्य होते.विशेष म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना मध्यस्थी घालून शिंदे यांचे सरदार जिवबादादांच्या मध्यस्थीमुळे डिसेंबर १७९३ मध्ये पेशव्यांनी सिध्दगड सावंतांना परत दिला.मात्र किल्ला देताना किल्ल्याचा मागील खर्च म्हणून २२ हजार रुपये घेतले.
सिध्दगडाचा हा संघर्ष ईथेच संपला नाही.पुढे सन १८०५-०६ मध्ये सावंतांच्या आपापसात वारसा हक्काचा संघर्ष सुरु असताना बंडाळी माजली.त्यात फोंड सावंतानी करवीरकरांना मदतीला बोलावले.करवीरकरांचे सैन्या आल्यावर फोंड सावंतानी ईतर किल्ल्याबरोबर सिध्दगड देखील त्यांना देउन टाकला.अर्थात यावेळी गडाचे किल्लेदार नारायण रुद्राजी हे सावंताशी एकनिष्ट असल्यामुळे त्यांना करवीरकरांचा अमंल गडावर नको होता.त्यांनी वेगळीच क्लुप्ती लढवली.साळशी महालाचा पेशव्यांचा अंमलदार चिटकोपंत यांच्यांकडून पैसे घेउन सिध्दगड त्यांच्या हवाली केला. पुन्हा एकदा सावंताना सिध्दगडाचा विरह सहन करावा लागला.मात्र यावेळी त्यांच्याकडे लढून गड ताब्यात घेण्याचे ना बळ होते ना कोणी मध्यस्थी करुन पेशवे गडाचा ताबा सोडण्याची शक्यता नव्हती. इक्डे सावंतांच्या घराण्यातील अंतर्गत वाद विकोपाला गेला होता.फोंड सावंत विरुध्द लक्ष्मीबाई व रावसाहेब या संघर्षात फोंडने करवीरकरांचा रागंण्याचा किल्लेदार राणोजी निंबाळकर व साळशी येथील पेशव्यांचा अंमलदार चिटकोपंत यांच्याकडे मदतीची मागणी केली.निंबाळकर रांगण्यावरील तर चिटकोपंत नुकत्याच ताब्यात घेतलेल्या सिध्दगडावरील शिबंदी घेउन मदतीला निघाले. आकेरी येथे या दोन्ही फौजा मिळून पोहचल्या असत्या राणोजीने चिटकोपंतांना कैद करुन त्यांना सिंधुदुर्गात कैद करुन ठेवले व सिध्दगडास वेढा घातला.त्याच्या मदतीला सिंधुदुर्गावरुन फौज आली मात्र सिध्दगडाने तिखट प्रतिकार केला.अखेरीस करवीरकरांना सिध्दगड घेता आला नाही.त्याचवेळी तिकडे सावंतवाडीला रावसाहेब वारला.
पुढे सप्टेंबर १८१७ च्या पत्रात सिध्दगडाचा एक उल्लेख मिळतो "दौलतराव शिंदेच्या पत्रावरुन फरांसीस (पोर्तुगीज ) मदतीसाठी गोव्याहून पलाड सिदिगडास आले आहेत.याकरिता कोकणार ;लोकास धाक पडला आहे."मात्र या घट्नेत पुढे काय घडले समजत नाही.
इंग्रज-मराठा अखेरच्या संघर्षात मार्च १८१९ मध्ये कर्नल इम्लाक सिध्दगडाजवळ दाखल झाला.मात्र त्याच्याकडे पुरेसे सैन्य व तोफा नसल्याने त्याने हल्ला केला नाही,.मात्र बाणकोटवरुन ८९ वे रेजिमेंट मदतीस आल्याने त्याने बेत बदलून १५ मार्च रोजी सिध्दगडाच्या दिशेने कुच केली.१६ मार्च रोजी ब्रिटीश फौजा सिध्दगडाच्या तटाबंदीवर आग ओकू लागल्या,आता प्रतिकार करणे कठीण आहे हे समजून गडाची शिबंदी गड सोडून पसार झाली.इंग्रजांनी सिध्दगडाचा ताबा घेतला.इंग्रजांचे सैन्य २७ मार्च पर्यंत ईथेच राहुन २८ मार्च रोजी भरतगडाचा ताबा निघाले.
मात्र बहुधा हा गड इंग्रजांनी करवीरकरांना दिलेला असावा.कारण १ सप्टेंबर १८१९ रोजी करवीरच्या राणी सईबाई यांना पुत्ररत्न झाले त्याच्या साखरेची पत्र सिध्दगडावर रवाना केली गेली.मात्र सिध्दगडाचा यापुढचा इतिहास अज्ञात आहे.सिध्दगडाला सोनगड असेही एक नाव आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाच्या मध्यातून गेलेला मुंबई गोवा महामार्ग दक्षिण-उत्तर गेला आहे.या महामार्गावरील कसाल या गावापासून सिध्दगडावर जाणे सोयीचे आहे.ओवळीयेचे हे सिध्दगडच्या पायथ्याचे गाव आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण व कणकवली या दोनही शहरातून येथे जाता येते.
१) मालवण - आचरा मसदे - ओवळीये - सिध्दगड (३५ किमी) किंवा मालवण (३३ किमी) - कसाल - (३ किमी) ओवळीये.
२) कणकवलीहून मुंबई - गोवा महामार्गाने कुडाळकडे जाताना कसाल गावाच्या (१ किमी) अगोदर ओवळीचे फाटा उजव्याबाजूस आहे. तेथून ओवळीये २ किमी वर आहे.

आपण ओवळीये गावातून सिध्दगडाची चढाई करु.ओवळीये गावातील शाळेच्या ओसरीवर १० जणांची रहायची सोय होऊ शकते.गडावर जेवणाची सोय नाही, ३ किमी वरील कसाल गावात होऊ शकेल.तेव्हा पॅक लंच घेउन निघायचे,ओवळीये गावातून मालवणच्या दिशेन दोन मिनीटे चालायचे. ग्रामपंचायतीजवळ रामेश्वर मंदिर आहे ,जवळच दगडी क्रशरची साईट आहे.इथून सिध्दगड ज्या पठाराला लागून आहे तिकडे पोहोचणारा लाल मातीचा कच्चा रस्ता असून अर्धा तासात सडा गाठातो.रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात वाहन नेता येणार नाही.सड्यावर पोहचलो कि सड्यावर वसलेली सिध्दवाडी दिसते.इथे थोडी झाडी व मागे वॉच टॉवर दिसतो.त्या दिशेने निघायचे. सिद्धगड पश्चिमेला निमुळता होत गेलेला टोकावर सिद्धगड उभा असून वाडीतून १५ / २० मिनिटाच्या अंतरावर सिद्धगड वर येउन पोहचतो.पठारावरून दिसणाऱ्या दाट झाडीत निमुळत्या होत जाणाऱ्या डोंगरावर सिद्धगडाचे बांधकाम केले आहे. दाट झाडीमुळे पटकन गड ओळखू येत नाही

३) मालवण - कसाल किंवा कणकवली - कसाल बससेवा आहे. कसालहून ओवळीयेला जाण्यासाठी ठराविक वेळेतच बसेस आहेत. म्हणून कसालहून जाण्या येण्याकरीता रिक्षा ठरवून गडावर जावे.

आपण ओवळीये गावातून सिध्दगडाची चढाई करु.ओवळीये गावातील शाळेच्या ओसरीवर १० जणांची रहायची सोय होऊ शकते.गडावर जेवणाची सोय नाही, ३ किमी वरील कसाल गावात होऊ शकेल.तेव्हा पॅक लंच घेउन निघायचे,ओवळीये गावातून मालवणच्या दिशेन दोन मिनीटे चालायचे. ग्रामपंचायतीजवळ रामेश्वर मंदिर आहे ,जवळच दगडी क्रशरची साईट आहे.इथून सिध्दगड ज्या पठाराला लागून आहे तिकडे पोहोचणारा लाल मातीचा कच्चा रस्ता असून अर्धा तासात सडा गाठातो.रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात वाहन नेता येणार नाही.सड्यावर पोहचलो कि सड्यावर वसलेली सिध्दवाडी दिसते.इथे थोडी झाडी व मागे वॉच टॉवर दिसतो.त्या दिशेने निघायचे. सिद्धगड पश्चिमेला निमुळता होत गेलेला टोकावर सिद्धगड उभा असून वाडीतून १५ / २० मिनिटाच्या अंतरावर सिद्धगड वर येउन पोहचतो.पठारावरून दिसणाऱ्या दाट झाडीत निमुळत्या होत जाणाऱ्या डोंगरावर सिद्धगडाचे बांधकाम केले आहे. दाट झाडीमुळे पटकन गड ओळखू येत नाही
दहा मिनिटात आपण बुजत आलेल्या खंदकाजवळ पोहचतो. हा खंदक ओलांडला कि गडाच्या नष्ट झालेल्या दरवाज्याशेजारील तटबंदी दिसते. आपण आल्याची कोणी वर्दी देणार नसेल यातून गडात प्रवेश करायचा. उजव्या हाताचा परिसर दाट झाडीने व्यापला आहे.वाट डावीकडे वळत जाते.या झाडीत रानडुकरांचा वावर आहे.
उजवीकडे एक चौथरा तसेच डावीकडे तटाजवळ चौथरा आणि त्यापुढे वाड्याचे जोते दिसते.
तटाकडेने वाटचाल सुरुच ठेवायची.पुढे एक मोठी बावडी ( विहीर ) दिसते.पन्नास फुट लांब व वीस फुट खोल अशा या जांभ्या दगडाच्या विहीरीत आत वाढलेल्या झाडांनी भिंतीना भेगा पडल्या आहेत.अर्थातच पाणी नाही.त्यामुळे गडावर येताना आपण पाणी आणणे आवश्यक आहे. विहीराला लागून भिंत आहे.थोडं पुढे जाताच चार खांब आणि मध्ये एक घुमटी नजरेस पड. हि भैरोबाची घुमटी! हेच सिध्दाचे देउळ ( चांभराई ) आहे.
तटाच्या कडेने तसेच चालत निघाल्यावर डाव्या हाताला खंदल दिसतो.हे खंदक शत्रु थेट तटबंदीला भिडू नये म्हणून बांधण्यात आले.मात्र यात पाणी साठत नाही.पुढे गेल्यावर गडाच्या टोकाला दाट झाडी असल्यामुळे टोकावर जाता येत नाही.उजवीकडे वळुन परतीचा मार्ग पकडल्यावर पुढे तटबंदी आणि बुरुज दिसतात.कातळकड्याचा वापर तटासाठी केला आहे.तटाखाली नैसर्गिक दरी असल्याने ईथे तटबंदी नाही.यबाजुला देखील दाट झाडी वाढल्याने गडाच्या टोकाशी जाता येत नाही.इथेच या गडाची फेरी संपते.लांबुडक्या आकाराच्या सिध्दगडाचा माथा जेमतेम असल्याने गडदर्शनास फार वेळ जात नाही.
अर्थात फक्त सिध्दगड बघाण्यासाठी या परिसरात येण्यापेक्षा या परिसरातील ईतर गडही एकाच भेटीत पहाता येतील. मालवणहून सकाळी निघून (१२ किमी) मसूरे जवळील भरतगड व भगवंतगड पाहून (१७ किमी) रामगडला जाता येते. तसेच रामगडहून ओवळीये गावातील (१० किमी) सिध्दगड पाहून कसाल मार्गे (३६ किमी) मालवणला येता येते. या मार्गाने हे ४ किल्ले एका दिवसात पाहून होतात.
हिवाळे सडा :-
ओवळीयेनजीकच्या सिध्दगडाला गेल्यावर न चुकता बघण्यासारखे आणखी एक ठिकाण म्हणजे 'हिवाळे सडा'. एकीकडे निसर्गसौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या सिंधुदुर्गात आता अतिप्राचिन असलेल्या कातळशिल्पांच्या खजिन्याची दिवसेंदिवस भर पडत आहे. रत्नागिरीपासून गोव्यापर्यंतच्या परिसरातील ही कातळशिल्पे कधी खणली? कोणी खणली? का खणली? कशासाठी खणली? हा कुतूहलाचा विषय आहे. अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे स्थानिक लोकांनी पांडवांशी जोडली आहेत. ‘पांडवांचो सारीपाट’, ‘लिवलेला काप’, ‘महापुरुष’ अशा वेगवेगळ्या नावांनी ही कातळशिल्पे ओळखली जातात. खरे तर ही कातळशिल्पे नसून रेखाचित्रे आहेत. ही कातळचित्रे मानवाला शिल्प घडविता येण्यापूर्वीची प्राथमिक पायरी असली पाहिजे. त्यामुळे ही कातळचित्रे काही हजार वर्षांपूर्वीची असू शकतात. कोकण किनारपट्टीला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या किनार्यावर सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. लक्षावधी वर्षांपूर्वी भूखंडांचे स्थलांतरण, भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यातून या पर्वतरांगा तयार झालेल्या आहेत. या सह्याद्री पर्वतांच्या माथ्यावर ज्वालामुखीतील लाव्हा रसाचे थरावर थर पसरून ‘लॅटराइट’ या प्रकारच्या जांभ्या दगडाचे सपाट पठार तयार झालेले आहे. लॅटराइटने बनलेल्या या सपाट कातळी भागालाच कोकणात ‘सडा’ असे म्हटले जाते. ज्या गावाच्या शेजारी हे पठार असेल, ते त्या गावाच्या नावाने ओळखले जाते - उदा., जामसंडे सडा, दाभोळे सडा, कुणकेश्वर सडा इत्यादी. या भागातील पठारांची नावे अशीच पडलेली पाहायला मिळतात. या परिसरात घरांच्या बांधकामांसाठीदेखील याच जांभ्या कातळातील चिरे कातून काढून वापरले जातात. हा कातळ तासून काढायला अतिशय कठीण व कष्टदायक असतो. हा लॅटराइटचा जांभा दगड काही ठिकाणी अत्यंत कडक जांभळट, काळ्या रंगाचा असलेला आढळतो. वरच्या थराचा हा भाग अत्यंत कठीण थरांचा बनलेला असतो आणि अशा प्रकारच्या कठीण भागावरील सपाटीलाच अनेकदा कोरून तासून तयार केलेली कातळशिल्पे आढळतात. यांना पुरातत्त्वीय भाषेत ‘पेट्रोग्लिफ्स’ असे म्हणतात. या प्रकारची कातळशिल्पे आता रत्नागिरी-राजापूरपासून पार गोव्यापर्यंतच्या सर्वच दक्षिण कोकणात सापडू लागली आहेत.
1990 साली डॉ. दाऊद दळवी यांनी रत्नागिरी येथील निवळे फाट्यावरील कातळशिल्पे उजेडात आणली. ही कातळशिल्पे भौमितिक आणि अमूर्त रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. लांबून पाहताना एकाद्या इलेक्ट्रिक सर्किटसारखी ही रचना दिसते. कोकणात अशी काही कातळशिल्पे असल्याचा हा पहिलाच उल्लेख आढळतो. प्र.के. घाणेकर यांनीही ‘कोकण पर्यटन’ या पुस्तकात कातळशिल्पांचा उल्लेख केलेला आढळतो. 1996-97 साली पालशेत भागात आर्किऑलॉजीचे काम सुरू असताना त्याच्या आसपासच्या भागातील कातळशिल्पे या टीमच्या पाहण्यात आली. त्या वेळी या रत्नागिरी-राजापूर परिसरातील कातळशिल्पांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या टीममध्ये सामिल असणार्यास श्रीकांत प्रधान यांनी रीतसर काम सुरू केले. त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स, उत्कृष्ट रेखाचित्रे तयार केली. स्थानिक लोकसंस्कृतीचा या शिल्पांशी काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या कातळशिल्पावर त्यांनी शोधनिबंधही सादर केले आहेत.
त्यानंतर 2000 साली रवींद्र लाड यांनी बारसू, देवीहसोळ, सोलगाव, गावडेवाडी या भागातील कातळशिल्पे शोधून काढली. बारसू या गावातील कातळशिल्प तर इतके मोठे आहे की त्याचे फोटो काढण्यासाठी ड्रोन कॅमेराच पाहिजे. जमिनीवरून त्याचे नीट फोटो काढताच येणार नाहीत, इतके ते शिल्प मोठे आहे. यात एक मोठी विशाल मानवाकृती असून तिने दोन हातांनी दोन वाघ रोखून धरले आहेत, असे विलक्षण दृश्य या शिल्पात पाहावयास मिळते. जगातील अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये या प्रकारचे चित्रणे आढळली आहेत. सिंधू संस्कृतीतील एका मुद्रेवरदेखील असेच चित्र पाहायला मिळते. त्यामुळे या कातळशिल्पांचा प्रवास सिंधू संस्कृतीपासून सुरू झालाय का? असा एक प्रश्न लाड यांनी उपस्थित केला आहे.
त्यानंतरच्या काळात मालवण येथील जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी हिवाळे, कुडोपी येथील कातळशिल्पे उजेडात आणली. हिवाळे येथील कातळशिल्पांना स्थानिक लोक ‘पांडवांची चित्रे’ या नावाने ओळखत असत. कुडोपी गावाजवळ ‘बावल्यांचे टेंब’ या नावाने ओळखल्या जाणार्या पठारावर सुमारे साठहून अधिक कातळशिल्पे असल्याची नोंद त्यांनी केली आहे. या शिल्पांचे महत्त्व ओळखून त्यांनी यावर आपला शोधनिबंध ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या 2012 साली झालेल्या 17व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सादर केला होता. त्यामुळे हा विषय जागतिक पातळीवर गेला. ‘ही कातळशिल्पे अतिशय भव्य व प्रेक्षणीय आहेत. वैविध्य, रचना, कलाकारी, सौदर्य, प्रमाणबद्धता या दृष्टीने ही कातळशिल्पे अतुलनीय आहेत. हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून त्याचे नीट जतन होणे आवश्यक आहे. या कातळशिल्पांचा दर्जा पाहता त्या काळात या परिसरात वास्तव्य करणारा मानवी समूह अतिशय प्रगल्भ असला पाहिजे’ असा अभिप्राय प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. सुंदरा अडिगा यांनी या परिषदेत व्यक्त केला होता.
अलीकडेच मालवण तालुक्यातल्या असरोंडी हायस्कुलचे शिक्षक कमलेश गोसावी यांनी हेदूळ आणि ओवळीये गावाच्या परिसरात तब्ब्ल १७ कातळशिल्प शोधून काढली. गोसावी यांनी शाळेतल्या अध्ययनाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रभेट उपक्रमाच आयोजन केल. त्यानुसार त्यांनी एका रविवारी हेदूळ आणि ओवळीये गावच्या परिसरातल्या कातळशिल्पांचा शोध सुरू केला. यामध्ये आपटय़ाचा कातळ परिसरात ११ कातळशिल्प आढळली असून यातली सहा शिल्पे सुस्थितीत आहेत. तर ओवळिये धनगरवाडीनजीक सहा कातळशिल्प आढळली असून यातीलही काही सुस्थितीत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी अश्मयुगीन मानवाच्या हत्यारांचे अवशेषही सापडले आहेत. एकंदरीतच कोकणातल्या मानव संस्कृतीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं हि कातळशिल्प उपयोगी असून त्यांचा अभ्यास होणं आवश्यक आहे.
संदर्भग्रंथः-
१) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
२) www.durgbharari.com हि वेबसाईट
३) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४) महाराष्ट्र देशातील किल्ले-चिंतामण गोगटे
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट