बापदेव घाटाजवळ एक दक्षिणोत्तर जाणारी डोंगररांग दिसते. पूर्वेच्या उजव्या बाजूस पुण्यापासून १० मैलांवर दिवे घाटाची दरड उभी आहे. दिवे घाट चढून गेले की, कऱ्हे पठाराची सीमा लागते. पूर्व-पश्चिम जाणारी ही डोंगररांग कर्णाकृती होऊन १०-२० मैल जाऊन विराम पावते. या पठाराच्या पूर्वेस आनंद भैरव नांदतो. साबगर खिंड, पानवडीची खिंड, पांगर खिंड आणि पुरंदर गड, वज्रगड, जेजुरीगड प्रसिद्ध स्थळांत मोडतात. सिंहगड रांग व पुरंदर रांग या दोन्ही एका ३-४ मैलांच्या रांगेने एकमेकांस संलग्न होतात.

आणि ह्या तिन्हीही रांगामुळे एक मोठे विस्तृत पठार तयार झाले आहे, या पठाराला कऱ्हे पठार म्हणतात. या पठाराची व्याप्ती सुमारे १०० चौरस मैलाची आहे. या पठाराच्या एका टोकास भुलेश्वर व दुसऱ्या टोकास मल्हारी मार्तंड उभे आहेत. आणि या पठाराच्या गर्भातून कऱ्हामाईचा झुळझुळ प्रवाह वाहत आहे. या प्रदेशावर पुराणप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध अनेक स्थळांची गर्दी झालेली दिसून येईल.

सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानकाकांची संजीवन समाधी आहे. सासवड मुक्कामी येणारे वारकरी हे सोपान काकांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. सासवडमध्ये माऊली आणि सोपानकाकांची भेट झाल्यानंतरच सोपानकाकांची पालखी प्रस्थान ठेवते म्हणजे माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आल्यानंतरच सोपानकाकांची पालखी हे पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवते. इथून पुढे वेगवेगळ्या मार्गाने जाणारे हे भावंडे पुढे वाखरी मध्येच एकत्र येतात.माऊलींची पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबते तिथे पालखी तळ बनवण्यात आलेले आहेत.
इतिहासाचा मोठा पट या परिसराने पाहिला आहे. श्रीशिवरायांनी स्वराज्याचा पाया इथेच घातला. मोगलांशी लढता लढता स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर याने येथेच देह ठेवला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला येथून जवळच आहे.. व पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचा उपक्रम इथेच केला. शिवकालीन स्वराज्याचे निष्ठावंत शूर सेवक जाधववाडीचे पिलाजीराव जाधवराव, पानिपतच्या संग्रामातून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा भिवडीचा जानू भिंताडा, नारायणराव पेशवे यांच्या वधप्रसंगी स्वामिनिष्ठेने धन्यास वाचविण्याच्या प्रयत्नांत अंगाच्या खांडोळ्या झालेला एखतपूरचा स्वामिभक्त चाफाजी टिळेकर, अठराशे सत्तावनच्या क्रांतीनंतर इंग्रजांना सतावून सोडणारा भिवडीचा शूर उमाजी नाईक, प्रसिद्ध समाजसुधारक सत्यशोधक महात्मा फुले, लावणीकार पठ्ठे बापूराव व सगन भाऊ, होनाजी बाळा, आचार्य प्र,के. अत्रे, जेजुरीच साहित्यमार्तंंड यशवंतराव सावंत, माळशिरस भुलेश्वरचे प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव आदींच्या कर्तबगारीने, धैर्यशौर्याने उजळून निघालेले हेच ते कऱ्हेपठार. श्री यादव यांनी क-हाकाठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी येथे सुरु केले. छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनही गेली अकरा वर्षे ते भरवीत आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांनी भरीव काम करुन पुरंदरच्या वैभवात भरच टाकली आहे. यादवकालीन भुलेश्वर, वारीच्या वाटेवर या महाकादंबरीचे ते लेखक आहेत. सासवड येथे २०१४ रोजी झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष होते.


पहिले धारातीर्थी : सरसेनापती बाजी पासलकर
"बाजी पासलकर झणजे मोठा युधी, शूर मर्दाना, ज्याच्या मिशा दंडा एवढया, मिशास पीळ घालोन केसाचे अग्रावर दोहीकडे दोन निबे ठेवावी व मनगटा येवढे नाक, असे त्याचे स्वरूप विक्राळ. त्यास राजे याणी योजून पाठविला."
सभासद बखरीत बाजी पासलकरांचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.
"बाजी पासलकर महायोध्दा, त्याच्या मिशा दंडायेवढया, यांस पीळ घालून वरि केशांच्या आधारे निबें दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला"
चित्रगुप्त बखरीत पुढील प्रमाणे वर्णन आहे
"पासलकर मोठा योद्धा, ज्याच्या मिशांवर मोठी लिंबे ठेवावी एवढ्या मोठ्या."
चिटणीस बखरीत सुद्धा
"बाजीराव पासलकर देशमूख मोसेखोरेकर यांस हषमलोक जमाव देऊन महाराजांनी पाठविले." असा उल्लेख आहे.

बखरींमधील उल्लेखावरून बाजी पासलकर यांचे स्वरूप व पद याबद्दल माहिती मिळतेच मात्र १६४२ साली बाजी पासलकर यांना मोगलांनी मोसे बुद्रुक येथे अटकेत ठेवले असल्याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी बाजी पासलकर मोसे बुद्रुक व तव या ठिकाणी सात भावांसहित राहत होते. यावेळी फितुरीमुळे बाजी मोगलांच्या हाती सापडले व त्यांच्या हाता पायांत बेड्या लावून त्यांना एका वाड्यात अटकेत ठेवण्यात आले होते.
एके दिवशी पहाटेच्या समयी बाजींची कुलदेवता श्री वाघजाई देवी हिने बाजींना दृष्टांत दिला व म्हणाली 'बाजी उठ! हात पाय झटक' हे एकून बाजींनी हात पाय झटकले असता एका हातातील व एका पायातील बेडी अकस्मात तुटून पडली. यानंतर बाजी देवीसोबत पश्चिम दिशेस निघाले, पुढे मौजे पाथरशेत येथे देवी आशीर्वाद देऊन गुप्त झाली.

यानंतर घोडदांडा मार्गे बाजी बांबीच्या पाण्यावर गेले या ठिकाणी तोरण माची आहे तिथे यमाजी हळदे यांचा वाडा होता. तेथे यामाजींची सून होती. बाजींचे दाढी मिशा असलेले विक्राळ रूप पाहून ती घाबरली. तेव्हा बाजी तिला म्हणाले की घाबरू नकोस, यामाजीस बोलावं. यमाजी आल्यावर त्यांनी बाजींच्या उरलेल्या दोन बेड्या तोडल्या. यानंतर बाजी आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन धामणहोळ मार्गे कोकणातील कुर्डुगडास गेले व तेथेच त्यांनी बराच काळ वास्तव्य केले.
या घटनेत बाजी पासलकरांच्या स्वरूपाचे जे वर्णन आहे ते बखरींतील उल्लेखाशी जुळते आणि बाजी पासलकर यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्यातील कुर्डूगड येथे होते हा उल्लेख बाजी पासलकर यांच्या पोवाड्यातही पुढीलप्रमाणे आहे. हा पोवाडा ज्या ग्रंथात प्रकाशित झाला आहे त्यामध्ये बाजी पासलकर यांच्याविषयी पुढील माहिती मिळते.
शिवाजी महाराजांच्या अत्यंत प्रितीतल्या बालमित्रांपैकी बाजी पासलकर एक होते. ते आठगावचे देशमुख असून रायगडाखाली छत्री निजामपूरजवळ कुर्डू या नावाचे खेड्यात राहत असत आणि खिंडीचे नाके सांभाळीत. तानाजी मालुसऱ्यांप्रमाणे बाजी पासलकर शिवरायांना अनेक युद्धप्रसंगी उपयोगी पडले होते आणि त्यांचे शौर्य आणि पराक्रम पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या पायदळाचे सरनोबत नेमिले होते. वाडीच्या सावंतांसोबत शिवाजी महाराजांच्या ज्या लढाया झाल्या त्यात महाराजांच्या सैन्याचे मुख्य बाजी पासलकर हे होते व यांच्यामुळे सर्वच युद्धांत महाराजांची सरशी होई. त्यांची एक घोडी होती व ती घेण्यासाठी विजापूरकरांनी खूप खटपटी केल्या होत्या.
बाजी पासलकर यांच्या पोवाड्यात पुढीलप्रमाणे माहिती आहे.
कुर्डूच्या मैदानी नांदे बाजी पासलकर, आठगावचा देसाई त्या बाजीचा धाक थोर।।
दंडा एवढी मिशी बाजी पाच्छाई मजहर।।
पोवाड्यात उल्लेख असल्याप्रमाणे बाजी पासलकर यांच्याकडे यशवंता घोडी, गजली नावाची फिरंग (धोप) आणि अजगर नावाची ढाल या तीन अप्रतिम गोष्टी होत्या.
रायगड जिल्ह्याच्या रोहे तालुक्यात अवचितगड नावाचा किल्ला आहे तिथे एक मूर्ती आहे व शिलालेख आहे. ही मूर्ती अवचितगडाचे किल्लेदार बाजी पासलकर यांची आहे असे मानले जाते. अवचितगडावरील शिलालेखात 'बापूजी पासलकर हवालदार' असा उल्लेख आहे. शिवकाळात किल्लेदार ऐवजी हवालदार हा शब्द वापरला जात असे. मराठी रियासतीत बाजींचे मूळ नाव बापूजी असल्याचा उल्लेख आहे. पासलकर वंशातील बाबुराव पाशिलकर यांचा उल्लेखही अवचितगडा संबंधात सापडतो. पासलकर घराण्याचे वंशज अवचितगडाच्या आसमंतात सध्या पाशिलकर या आडनावाने आजही ओळखले जातात.
बाबुराव पासलकर यांचा उल्लेख पुढीलप्रमाणे,
बाबुराव पासलकर, तालुके अवचितगड, याणीं सरसुभाकडील लोक घेऊन किल्यास वेढे देऊन, रसद बंद केली. ते किल्ले बी तपशील.
बाजींची समाधी आज सासवड जवळ कुंभारवाडा येथे आपल्याला बघायला मिळते.बाजींना वंशपरंपरागत यशवंतराव ही पदवी होती, त्यामुळे या समाधीला यशवंतबाबांची समाधी म्हणून ओळखले जाते. पुण्याजवळील वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजी पासलकरांचे नाव देऊन गौरवण्यात आले. बाजी पासलकरांचे स्मारक पुण्यातील दत्तवाडी येथे तानाजी मालुसरे रोड वर आहे. बेलसर गावात बाजींचे स्मृतीस्थळ आहे. अशा या वीर सरसेनापती बाजी पासलकरांच्या चरणी मानाचे वंदन! या सर्व समाधी व स्मृतीस्थळांना आयुष्यात एकदा नक्की भेट दिलीच पाहिजे.
शिवरायांचे एकनिष्ठ सहकारी असलेल्या बाजी पासलकर व पासलकर घराण्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे, इतिहासात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या या घराण्याविषयी आणखी माहिती उजेडात आणणे हे त्यांच्या स्वराज्यकार्यास न्याय दिल्यासारखे होईल.
बाजी पासाल्कारांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.
१) या घराण्याचे मुळपुरुष सोमवंशी राजा वसुषेण असून त्यांना चांद्रवंश सोमवंश आहे.
२) हे घराणे मुळ राजस्थानातील भरतपुरचे मानले जाते.
३) घराण्याचे राजचिन्ह घोडा असून निशाण भगवा ध्वज आहे.
४) खंडेराव भैरवनाथ हे कुलदैवत असून जोगेश्वरी ( सोनोरी आणि लोणी भापकर येथील ) हि कुलदेवता आहे.
५) देवक उंबर, पिप्पळ, कंदब आणि वड वृक्ष
६) दालभ्य ऋषी हे गुरु असून गायत्री मंत्र हा घराण्याचा मंत्र आहे.
७) इतर ( जोड ) आडनावे :- आवळे, आमरे, इथापे, कबरे, काटेधर, काशिंदे, कोंडे, कोरकर, खंबीर, खांबरकर, गाडेकर, चपराखे, जकाते, जगजाहीर, जगदीश, जगमित्र, झांगडे, ढाले, ढिसाळ, तामस, दिसरात, दुख, दुर्जर, डोंबे, डोंगरवाटे, दुबळे, देवब्डले, धोलप, नागड, निम्से, पठाण, पाठर, पाडेकर, पाडघरे, पाडे, पाडवे, बावळे, वारहाते, येवले, रणसिंग, बाईड, वाळूंज, बयाले, वाझे, विसाळे, सांगे, साबणे, साभरे, सागोळे, सुरकर, ढेन्डे, नावे, नवलाखे, नागशुळे, बाली, बहातरे, शामकर्ण, हेंबडे, खेनात, शिंदोरे
जगताप घराण्यातील महत्वाचे वीर :-



जगताप घराण्यातील नंदाजीराव जगताप या वीराची समाधी पांढरीच्या ओढ्यात आहे. नंदाजीराव यांना पुरंदरच्या युद्धात वीरमरण आले होते. मात्र ही समाधी त्यांची आहे का? याविषयी मात्र अजून काही माहिती नाही त्यामुळे आपण सध्या तरी या समाधीला नंदाजीराव यांची संभाव्य समाधी म्हणूनच समजूया.

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे स्मारक :-

भट घराणे श्रीवर्धन मधील प्रतिष्ठित घराणे. जे पुढे स्वराज्याचे पेशवे म्हणून नावारूपाला आले.
या घराण्यातील पहिल्या पुरुषाचा उल्लेख महादजीपंत भट या नावाने मिळतो. जे दंडा-राजपुरी येथील देशमुखी सांभाळत होते.
- महादजीपंत भट - एकूण मुले दोन. = १. परशुराम पंत २. नारोपंत.
- परशुराम पंत - एकूण मुले दोन. = १. विश्वनाथ २. कृष्णाजी.
- विश्वनाथ परशुराम भट -एकूण मुले पाच .= १.कृष्णाजी. २. जनार्दन. ३. रुद्रजी ४. बाळाजी(बालाजी विश्वनाथ भट) ५.विठ्ठल.
- बाळाजी विश्वनाथ भट (भट घराण्यातील पाहिले पेशवे) - पत्नी - राधा बर्वे - एकूण मुले सहा. औरस = १. थोरले बाजीराव. २. चिमणाजी (इतर नावे - अनंत, चिमजीआप्पा) ३. भिऊबाई. ४. अनुबाई. अनौरस = १. राणोजी शिंदे. २. भिकाजी शिंदे.
- बाजीराव बल्लाळ भट. मूळ नाव - विश्वनाथ, विश्वासराव. - पत्नी - काशीबाई जोशी - एकूण मुले सहा. औरस = १. नानासाहेब २. रामचंद्र(बालमृत्यू) ३. मुलगा(बालमृत्यू) ४. रघुनाथराव ५.जनार्दन. अनौरस = १. समशेर बहादूर(कृष्णराव - मस्तानीबाई)
- नानासाहेब बाजीराव भट . मूळ नाव - बल्लाळ, बाळाजी. - पत्नी - गोपिका रास्ते, राधा वखारे. एकूण मुले पाच. १.विश्वासराव २. माधवराव. ३. यशवंत(बालमृत्यू) ४.मोरेश्वर(बालमृत्यू) ५.नारायणराव.
- माधवराव बाळाजी भट. - पत्नी - रमाबाई जोशी. - संतती नाही.
- नारायणराव बाळाजी भट - पत्नी - गंगाबाई एकूण मुलं एक. १. माधवराव.(सवाई)
- रघुनाथराव बाजीराव भट - पत्नी - आनंदी ओक. एकूण मुले सहा. १. भास्कर. २. विनायक ३. दुर्गाबाई ४. बाजीराव. ५.चिमणाजी. दत्तक - १. अमृतराव
- सवाई माधवराव नारायणराव भट - पत्नी - यशोदा गोखले. संतती नाही.
- बाजीराव रघुनाथ पेशवे - पत्नी- सरस्वतीबाई. औरस संतती नाही
रघुनाथरावांच्या दत्तक पुत्राचे, अमृतरावाचे वंशज डॉ. उदयसिंग पेशवा पुण्यात राहतात. आणि समशेर बहादूर यांचे वंशज बांदा येथे राहतात.


सूर्यराव काकडे :-
राजे उमाजी नाईक :-
सरदार पुरंदरे वाडा :-
पेशवाईमध्ये महत्वाचे स्थान असलेल्या पुरंदरे घराण्याचे इतिहासात उल्लेख सापडतात. शके १६२५ (सन १७०३) मधील एका पत्रात ‘कसबे’ सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले अशी नोंद आहे. शके १६१४ (सन १६९२) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंदीस (जिंजीस) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहे, अशी एका पत्रात नोंद आढळते. यावरून असे म्हणता येईल की, पुरंदरे घराण्याकडे परंपरागत कुलकर्ण वतन होते. या घराण्यातील अंबाजीपंत ही व्यक्ती धनाजी जाधवराव यांच्या बरोबरीचीच असल्याचे दिसते. शके १६१४ मध्ये पुरंदरे मराठ्यांचे साक्षात नोकर होते. शके १६२४ मध्ये ते सुखवस्तू रयत आहेत.सासवड गाव कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे असे. शके १६२३ मध्ये अत्रे आणि पुरंदरे यांचा वाद असल्याचे दिसते. रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधवराव, सचिव शंकराजी नारायण यांच्याशी पुरंदरे यांचा दृढ परिचय होता. या घराण्यातील ‘हेरंब’ नावाचा माणूस बराच महत्त्वाचा होता. तुको त्र्यंबक, अंबाजी त्र्यंबक या बंधुद्वयाखेरीज त्यांचे चुलत भाऊ काशी, गोमाजी, गिरमाजी, विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव पुरंदरे हेसुद्धा आपल्या बकूबाप्रमाणे राजकारणात वावरत होते. सेनापती धनाजी जाधवराव यांच्या कृपेने यांना थोर पद प्राप्त झाले.
छ. शाहूमहाराज सुटून आल्यावर लामकानी (खानदेश) येथे अंबाजीचा पुतण्या मल्हार तुकदेव हा शाहूराजांना भेटला. त्या वेळी काही अत्रेमंडळीही शाहूराजांकडे सामील झाली. सन १७०८ मध्ये शाहूराजे सातारला विधियुक्त अभिषेक करून छत्रपती झाले. अंबाजीपंत व खंडो बल्लाळ यांचा स्नेह जुळला. पंतांच्या सहाय्याने बाळाजी विश्वनाथाने कर्ज काढून फौज बनविली. शाहूराजांनी सेनापति पदावरून चंद्रसेनास काढल्यावर पुढे त्याचा भाऊ संताजी यास नेमले. नंतर सन १७१२ मध्ये मानसिंग मोरे यास सेनापती नेमले व त्याचे दिमतीस आपल्या भरवशाचा अंबाजीपंत यास नेमले. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर दि. १७ एप्रिल १७२० रोजी बाजीरावास छ. शाहू महाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत पुरंदरे यांना मुतालिकीची वस्त्रे करून दिली. पुरंदरे मुतालिक म्हणून साताऱ्यास शाहूमहाराजांजवळ राहत असत. अंबाजीपंत, त्यांचा मुलगा.
महादेव, मल्हार तुकदेव ऊर्फ दादा, त्र्यंबक सदाशिव ऊर्फ नाना हे शाहू महाराजांजवळ राहून पेशव्यांची बाजू सांभाळीत. सन १७३७ मध्ये अंबाजीपंत, पिलाजी जाधव व राणोजी भोसले आणि आनंदराव पवार यांनी माळव्यात मोठी स्वारी करून दयाबहादुराशी कित्येक संग्राम व व्यवहार केले. कोल्हापूरकर संभाजीराजे यांच्या व शाहू महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगी जाखणवाडी गावच्या मैदानात अंबाजीपंत होते (१७३१). उमाबाई दाभाडे यांच्या भेटीसाठी शाहू महाराजांनी काही महत्त्वाची मंडळी पाठवली होती. त्यांत अंबाजीपंत होते.
बाजीराव पेशव्यांशी अधिकारवाणीने अंबाजीपंत बोलत असत. तरीसुद्धा त्यात आदब राखत असत. पेशवे लहान असले तरी अंबाजीपंतांस पत्रातून ‘चिरंजीव असे संबोधत असत. बाळाजी ऊर्फ नानासाहेब यांना जेव्हा दमाजी गायकवाडाने पकडले त्या वेळी अंबाजीपंतांनी त्यांना दंड भरून सोडविले. बाजीरावविरुद्ध कारस्थाने करणारी सरदारांना पत्रे लिहून त्यांचा बंदोबस्त केला. अंबाजीपंत पेशव्यांचे कारभारी व उपमंत्रीच होते. त्यांचा मृत्यू भाद्रपद शु।८ शके १६५६ (सन १७३५) ला माहुली येथे झाला. त्यांच्या सौभाग्यवती बयाबाई यांनी सहगमन केले. महादोबा व सदाशिव हे त्यांचे पुत्र. पानिपतच्या युद्धात बाबा पुरंदरे होते. त्यांना ग्वाल्हेरच्या दरम्यान व्यवस्थेसाठी मागे ठेवले होते. महादोबा पुरंदरे हे नानासाहेबांच्या वेळी एक अत्यंत सज्जन व पेशव्यांच्या गुरुस्थानासारखे होते. मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत कर्तृत्ववान व निष्ठावंत अशी बहुमोलाची माणसे या घराण्याने दिली.
या सरदार पुरंदरेंचा वाडा आज सासवडमध्ये भग्नावस्थेत उभा आहे. वाडा पडण्याच्या बेतात असल्यामुळे इथे सध्या पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. सासवड एस. टी. स्टँडपासून केवळ दहा मिनीटाच्या अंतरावर हा वाडा आहे. वाडयाभोवती तटबंदी दिसते. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी बांधलेले गणपती मंदीर दिसते. त्याला बाहेरुन प्रवेश दिला आहे, ज्यामुळे भाविक सहजपणे मंदीरात जाउ शकतील. वाड्याच्या तटबंदीत बुरुज आहेत, तसेच दरवाज्यावर लोखंडी खिळे पहायला मिळतात. दरवाज्याच्या वर बंदुकीसाठी जंग्या आहेत, तसेच बाहेर उभ्या असलेल्या शत्रुच्या अंगावर तेल ओतायची व्यवस्था आहे. दरवाज्यातून आपण मुख्य चौकात प्रवेश करतो. इथे भग्न असलेल्या वाड्याचे सौंदर्य आणि भव्यता आपल्याला जाणवते. चौकात पुष्करणी आहे.
वाड्याला तळघर देखील आहे. अर्थातच इथेही भिंती पडलेल्या आहेतच. स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे इथून एक भुयार थेट जाधवगढीत जाते जी जवळपास इथून सात कि.मी. दूर आहे. अर्थातच यात तथ्य नसावे. तळमजल्यावर असणार्या ओसरीचे खांब एका रेषेत बघणे हे त्याकाळच्या वास्तुशैलीची प्रगती दर्शवते. या वाड्यासाठी चपट्या आकाराच्या वीटा वापरल्या आहेत, ज्यांना 'पुस्तकी वीटा' म्हणतात.इथेच काही चित्रपटांचे जसे एक डाव भुताचा, तुंबाड यांचे शुटींगही झाले आहे.
संदर्भ -महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग-२
आपलाच युवा मित्र
संकेत किसन देशपांडे

संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर (सासवड) :-
मंदिराच्या बाजूने पुढे आल्यावर उजव्या हाताला मुख्य सभामंडप आहे. या मंडपात मध्यभागी भव्य अशी वीर मारुतीची मूर्ती आहे. अनेक लाकडी खांबावर हा मंडप उभा असून यातले सहा लाकडी खांब कलाकुसरीने भरलेले आहेत. याच मंडपात रोजचे प्रवचन व विशेष दिवशी कीर्तनाचे कार्यक्रम होतात. इथेच विणेकरी वीणा घेवून उभे असतात. या सभामंडपाच्या पुढेच दगडी मंडप आहे. दगडी मंडपातून आत गेल्यावर डावीकडे राम लक्ष्मण व उजवीकडे विठ्ठल रखुमाई आहेत. या मंडपातून दोन्ही देवांच्या मधून गाभाऱ्यात प्रवेश करता येतो.
गाभाऱ्यात संत सोपानदेवांची समाधी आहे. काळ्या पाषाणातील समाधी पायऱ्यांची आहे. सकाळी नित्य पूजेनंतर समाधीवर मुखवटा ठेवला जातो.समाधीच्या मागील बाजूस मुरलीधर कृष्णाची मूर्ती आहे .
संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरांचे बंधू यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा शके ११९९ (ईस १२७७) मध्ये झाला. भगवदगीतेवर त्यांनी साररूप ओवीबद्ध टीका ” सोपानदेवी ” या नावाने लिहिली. वयाचे १९ वे वर्षी त्यांनी मार्गशीर्ष वद्य तृतीया शके १२१८ ( ईस १२९६) साली त्यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली, समाधीच्या दक्षिण भागी एक विस्तीर्ण असा जुना चिंचेचा वृक्ष असून तिथे सोपानदेवाच्या पादुका आहेत. तेथून समाधिस्थळी सोपानमहाराजांनी प्रवेश केल्याचे सांगतात.
जेष्ठ वद्य द्वादशीला ला संत सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान होते. प्रस्थान म्हणजे पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघते.
भैरवनाथ मंदीर :-
सासवडमध्ये असलेले हे मंदीर बाहेरुन बघून अंदाज येत नाही, पण तरीही एका गोष्टीसाठी या मंदीरात आवर्जून जावे.




डोंगर चढायला अगदी सोपा.. ५-१० मिनिटात आपण चढून लेण्यांजवळ येतो.

छोट्याशा डोंगरात पोखरलेली ही लेणी. दुमजली.

खालच्या गुहेचे दोन भाग. आतला भाग गाभाऱ्या सारखा.

तिथेच ही मूर्ती दृष्टीस पडते. कोणीतरी कोरण्याचा प्रयत्न केला पण काही कारणाने ते पूर्णत्वास गेले नाही. शेंदूर अर्चित आणि मूर्तीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने तिची ओळख पटणे खरोखरच कठीण. फक्त कयास बांधला जाऊ शकतो. मूर्तीकडे निरखून पाहिल्यास तीन मुख असणारी मूर्ती कोरण्याचा प्रयत्न केला आहे असे लक्षात येते.

डावीकडील मूर्ती
ह्या मूर्ती रचना पाहता त्या आठव्या ते नवव्या शतकातील असाव्या असा अंदाज आहे.

वरच्या भागात चढायला किंचित कसरत करावी लागते. वरच्या भागात काही कोरीव कारागिरी नाही. शेंदूर अर्चित काही दगडी प्रतिमा आहेत.

लेणीस्थित डोंगरावरून पुरंदर आणि वज्रगडाचे दर्शन होते.
ह्या लेण्याचा मागोवा घेतल्यास काही माहिती मिळू शकते का हे पाहणे महत्वाचे आहे.कदाचित खडकात असलेल्या दोषामुळे लेणी कोरणे सोडून दिले असावे.लेणी स्थापत्यशास्त्रादृष्ट्या महत्वाचा पुरावा असा कोणताही शिलालेख नसल्यामुळे याची काल ठरवणे अवघड आहे. लेणी मात्र अचंबित करणारी आहेत. कोणी बांधली, का बांधली, कशाची मूर्ती कोरण्याचा हेतू होता, का अपूर्ण राहिला..इ. प्रश्न लेणी पाहल्यावर समोर येतात.ह्या प्रश्नांना मनात घोळवतच डोंगर उतरायचा
श्री लवथळेश्वर मंदिर :-








सरलष्कर दरेकर वाडे - आंबळे ता.पुरंदर
महाराष्ट्रात वाडे व गढीकोट यांची संख्या हजारोच्या घरात आहे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. तसेच बरेचसे गढीमालक इतरत्र स्थलांतरीत झाल्याने काही गढ्या ओस पडुन उध्वस्त झाल्या आहेत. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. आंबळे गावात असलेली सरलष्कर दरेकर यांची गढी त्यापैकी एक पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील दरेकर गढी पुण्यापासुन सासवडमार्गे ४८ किमी अंतरावर असुन सासवड आंबळे हे अंतर १६ किमी आहे पेशवाईत घोडदळाचे सेनापती खंडेराव दरेकर यांचे वतन असलेले भरभराटीस आलेले हे गाव आजही त्याच्या अंगाखांद्यावर गतकाळाच्या वैभवशाली खुणा बाळगुन आहे...
मुळात आंबळे गाव एका कोटात वसलेले असुन कधी काळी या संपुर्ण गावाला तटबंदी व बुरुज असल्याच्या खुणा जागोजाग दिसुन येतात या नगरकोटाच्या तट बंदीच्या आतच पेशव्यांचे घोडदळाचे सेनापती खंडेराव दरेकर यांचा वाडा व इतर काही वाडे होते आंबळे गावात फेरी मारताना आजही पडीक अवस्थेत असलेले हे वाडे मोठया प्रमाणात दिसुन येतात गावात प्रवेश करणारा रस्ता या कोटाच्या उध्वस्त दरवाजातुनच आत शिरतो बारकाईने पाहिल्यास आजही या कोटाच्या दरवाजाची कमान व त्या शेजारील दोन ढासळलेले बुरुज आजही पहायला मिळतात रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेल्या उध्वस्त दगडी तटबंदीच्या प्रांगणात दोन पेशवेकालीन मंदिरे पहायला मिळतात यातील राजराजेश्वर मंदिर म्हणुन ओळखले जाणारे शिवमंदीर पूर्वाभिमुख असुन सभामंडप व गर्भगृह अशी याची रचना आहे मंदिराचा मंडप नक्षीकामाने नटलेला असुन कोरीव कामावरून हे मंदिर पेशवे काळातील असल्याचे जाणवते यातील दुसरे मंदिर रामाचे आहे गावात शिरण्यापुर्वी अलीकडेच रस्त्याच्या उजव्या बाजुला एक भलीमोठी दगडात बांधलेली बारव दिसते या बारवचे पाणी आजही वापरात आहे या बारवच्या समोरच आपल्याला कोटाचा आजही कमानी सकट आजही सुस्थितीत असलेला कोटाचा दुसरा दरवाजा व मोठया प्रमाणात घडीव दगडांची तटबंदी दिसुन येते गावात शिरल्यावर सर्वप्रथम हनुमानाचे मंदिर असुन या मंदीरासमोर पेशवाईतील सरलष्कर खंडेराव दरेकर यांचा वाडा आहे. पूर्वेस उताराच्या रस्त्यावर अगदी जवळच समोरासमोर दक्षिण व उत्तरेस भव्य मुख्य प्रवेशद्वारे असलेले दोन सरदार दरेकरांचे वाडे दृष्टीस पडतात. दक्षिणाभिमुख वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दुमजली कोरीव तीन दगडी कमानी असणारी तत्कालीन वास्तू आपले लक्ष वेधून घेते तर तिच्या समोरील सरदार दरेकरांचा भव्य व दुरूस्तीसह रंगरंगोटी केलेला वाडा गतकालीन वैभवाची साक्ष देण्यास पुरेसा आहे.आंबळे गावात प्रवेश करताना उजव्या बाजूला या वाड्याचा भाला मोठा बुरूज दिसून येतो. वाड्याचा मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा म्हणुन ओळखला जातो. वाडयाच्या या दरवाजाशेजारी दोन बुरुज असुन समोरील बाजुस नगारखाना व दुसरा वाडा आहे. गढीचा परीसर साधारण तीन एकरचा असुन गढीचे बुरुज व तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहेत. गावात फेरी मारताना आपल्याला इतरही काही वाडे पहायला मिळतात. गावात भैरवनाथाचे म्हणजे शंकराचे अजुन एक मंदिर असुन या मंदिराला देखील तटबंदी आहे. पेशवाईतले घोडदळाचे सरसेनापती खंडेराव दरेकर यांच्यामुळे आंबळे गावाला एक ओळख आहे. आंबळे गावच्या पाठीमागे असलेल्या ढवळगडवर जाण्यासाठी आंबळे गावातुन रस्ता जातो. दरेकर यांच्या भोसरे येथील खटाव शाखेच्या इनामदार लहुराज दरेकर या वंशजांनी दिलेल्या माहितीनुसार दरेकर हे मोरे या ९६ कुळाचे उपकुळ आहे...
शिवकाळात सामान्यातून असामान्य कर्तृत्व करणारी अनेक घराणी छत्रपतिंच्या प्रेरणेने स्वराज्य स्थापनेत सहभागी होऊन इतिहासात गौरवाने वर्णिली गेली आहेत. क-हेपठारावरील अनेक घराण्याप्रमाणे दरेकर घराणे हे छत्रपतिच्या लष्कराचा महत्त्वाचा घटक होते. मुळ सातारा येथील जावळी भागातील दारे गावचे ते दरेकर किंवा दऱ्याखोऱ्यातील वीर ते दरेकर म्हणुन ओळखले जातात शिवकाळात हिरोजी, गणोजी हे पायदळाचे असामी म्हणून मराठा सैन्यात होते त्यांचे वारस सुभानजी, गोरखोजी, मानाजी, गौरोजी यांना अनेक गावचे मोकासे होते मराठयांमधील मोठ्या इनामदारांमध्ये दरेकर अग्रणी होते. यांचा पराक्रम उभारून आला तो पेशवेकाळात. हे गणोजी दरेकर, येसाजी दरेकर व बाळाजीराव दरेकर या सरदारांच्या नावाचा उल्लेखाने प्रमाणित होते. छत्रपति शाहू महाराजांच्या कालखंडात दरेकर लष्कराचा घटक असल्याचे उल्लेख आढळून येतो. छ.शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली थोरले बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत अनेक पराक्रमी व्यक्तिमत्त्व उदयास आली. राणोजी शिंदे, सुभेदार मल्हारराव व इतरहि बहुसंख्य पराक्रमी सरदार निर्माण झाले तर सरदार दरेकरांना नावलौकिक मिळाला तो हा कालखंड होय. आंबळे हे गाव छत्रपती शाहुराजे यांनी सुभानजी दरेकर यांना लष्कर खर्चासाठी इनाम दिले यांचे वंशात खंडेराव दरेकर सरलष्कर झाले त्यांनी माधवराव पेशवेंचा पिसाळलेल्या हत्तीपासून जीव वाचवला पेशवे काळात पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन, कर्नाटक, खानदेश येथे झालेल्या मराठ्यांच्या लढायात प्रमुख सरदारा मध्ये दरेकर यांचा समावेश होतो शनिवार वाड्याजवळ आजही दरेकरांचा वाडा आहे
विशेषतः इ.स.१७५७ च्या सप्टेंबरमधे मराठ्यांनी कर्नाटकातील कडाप्पाचा नवाब अब्दुल मजीदखान मायणा याच्या ताबेदारीत असलेल्या कोलार, होसकोट व बाळापूर हल्ला केला तेव्हा सरदार इंद्रोजी कदम, सोनजी भापकर यांच्याबरोबर असलेल्या खंडेराव दरेकर यांनी पराक्रम करून विशेष प्रसिद्धी प्राप्त केली. पेशवे नारायणराव यांची शनिवारवाड्यात हत्येनंतर सरलष्कर खंडेराव दरेकरांनी राघोबादादांचा पक्ष सोडून बारभाई पक्षास सामील झाले.खंडेराव दरेकरांना सरलष्कर ही पदवी पेशवाईत मिळाली होती तर त्यांचे आजोबा दादाजी दरेकरांनी पानिपत युद्धात देह ठेवला होता. इ.स.१७९४ मध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघना वरून परत आल्यावर शनिवार वाड्यातल्या दरबार महालात पेशव्यांनी रुपये ८२७ एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे हणमंतराव दरेकर यांना दिल्याची नोंद आढळते...सरलष्कर दरेकरांकडे इ.स.१७९५ साली पुणे प्रांतातील आंबळे हा गाव इनाम होता तर बीडव पाथरीचे चौथाई अंमल होता. बारामती तालुक्यातील जळगाव, उंडवडी व पुरंदर तालुक्यातील नायगाव ह्या तीन गावांचा मोकासा होता. १७९५ साली दरेकरांकडे एकूण १ लाख १६ हजार ८५ रुपयेचा संरजाम असल्याचा उल्लेख आढळून येतो. याच वर्षी मराठे व निजाम यांच्यामधे खर्डा येथे झालेल्या लढाईत सरलष्कर खंडेराव पुत्र हणमंतराव दरेकरांनी तरवार गाजविल्याची नोंद आढळून येते.
सरलष्कर खंडेराव दरेकर यांचा शिक्का खालीलप्रमाणे
श्री
चरणी तत्पर
जयाजीसूत खंडेराव
दरेकर सरलष्कर
त्यामुळे या भागातील लोकांच्या बोलण्यात कधीतरी हमखास येणार वाक्य म्हणजे," अमुक तमुक काय स्वतःला आंबळेचा जहागीरदार समजतोय का ?"
इतिहास समजुन घेतल्यावर वाड्याची सैर करुया.डागडुजी केलेल्या वाड्याला मुख्य दरवाजा जरी उत्तरेला असला तरी त्याच वाड्याला पूर्वेकडील तटबंदीत एक भला दरवाजा आहे. समोरच्या मोकळ्या जागेत हिरवळ व विविध रंगीबेरंगी फुलझाडे आकर्षक रचनेत लावलेली दिसतात. मोकळ्या पटांगणातून पूर्वेकडील दरवाजाने आत प्रवेश केला कि दगडी बांधकामातील चौकात आपण येतो. या चौकात उत्तरेचा भाग सोडून तीनहि बाजूंनी सोप्याची आकर्षक इमारत लक्ष वेधून घेते. दक्षिणेस जाणारा भुयारी मार्ग लोखंडी जाळीच्या दरवाजाने बंद केल्याचे आढळून येते दक्षिणेच्या सोप्यातील दालनात दिवाणखाना आहे. उच्च अभिरुचीची बैठक व्यवस्था व घराण्यातील कर्तबगार व्यक्तीच्या तसबीरी व ढाल तरवार भिंतीवर लावलेल्या दिसतात. मग आपण पहिल्या चौक व दुसरा चौक यांच्या दरम्यान असलेल्या भागातून पहिल्या चौकात पोहोचतो. हा चौक आयताकृती असून मुख्य प्रवेशद्वाराचा आतील भाग पाहता येतो. तीन फूटांच्या उंचीचा घडीव दगडी बांधकामातील चौक तत्कालीन वैभवाची मूकपणे साक्ष देतो. मुख्य दरवाजेच्या आतील बाजूस दरवाजाचे आतील असणाऱ्या देवड्या व त्याच्याशेजारी असलेल्या घडीव दगडी बांधकामातील पूर्वेस व पश्चिमेस असलेल्या भुयारी मार्गाचे उतरते जीने दिसतात. पूर्वेकडील भुयारी मार्ग हा पूर्वेकडील असलेल्या श्रीराम मंदिराकडे व पश्चिमेकडील भुयारी मार्ग हा ग्रामदैवताकडे जात असावा हा माझा अंदाज आहे. मग आपण मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेल्या बुरूजावर दगडी जीन्याच्या पायरी मार्गाने पोहोचतो.
मग पुन्हा खाली उतरून आल्या मार्गाने म्हणजेच पूर्वेकडील दरवाजाने बाहेर पडावे. पूर्वेकडील रस्त्याच्या पलिकडे पडझड झालेल्या मोठ्या आकाराच्या तटबंदीत सुरेख पूर्वाभिमुख मंदिरे आहेत. या परिसराच्या दक्षिणेस दोन लहानमोठ्या घडीव दगडी बांधकामातील पाण्याने भरलेल्या बारवा आहेत. मोठ्या बारवेत उतरण्याठी पश्चिमेकडून पायऱ्या आहेत परंतु वापरात नसल्यामुळे आसपास गवत व झुडुपे वाढलेली आहेत. बारवा पाहून आम्ही मंदिराजवळ यावे. पेशवाई कालखंडात दगडी बांधकामातील श्री राम मंदिर व तुळजा भवानीचे अप्रतिम मंदिर आहे. मंदिराचे शिखर भाजक्या वीटांचे केलेले आहे. श्रीराम मंदिरात राम, लक्ष्मण व सीतामाईच्या सुबक मूर्ती स्थानापन्न असून ह्या सर्व मूर्ती बखतराम नावाच्या राजस्थानी व्यक्तिने तयार करून पेशव्यांना दिलेल्या होत्या, त्या पेशव्यांनी सरलष्कर दरेकरांना भेट दिलेल्या आहेत. याच मंदिराच्या पिछाडीस थोरल्या वाड्यातून भुयारी मार्ग येतो असे म्हणतात. मंदिराच्या पाठीमागील जेथे भुयारी मार्ग येते तेथे तळघर असून तेथे ध्यान मंदिर असल्याची माहिती मिळते. या तळघराला लागूनच पश्चिमेस चौकोनी विहीर आहे ती आपणांस दिसून येते. मंदिर परिसरातील पडझड झालेल्या पूर्व - पश्चिम तटबंदीत दोन भव्य दगडी बांधकामातील प्रवेशद्वारे अस्तित्वात आहेत. श्रीराम मंदिराच्या पूर्वेस लहान पण सुरेख हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या पूर्वेस अतिशय प्रेक्षणीय श्री राजेश्वर शंभू महादेव मंदिर आहे. मंदिर सभागृह व गर्भगृह स्वरूपात असून सभामंडपात तीन कलाकुसर केलेल्या दगडी कमानीत आहे. पेशवेकालीन स्थापत्यकलेने ओतप्रोत असलेले दगडी स्तंभ तत्कालीन उच्च अभिरुचीची जाणीव करुन देतात. दक्षिण व उत्तरेच्या भिंतीत दोन्हीहि बाजूच्या कोनाड्यात श्री गणपति मूर्ती आहेत. तर गर्भगृहालगत असलेल्या दोन्ही कोनाड्यात उत्तरेस पन्हळी असलेल्या शिवपिंडी आहेत. गर्भगृह काहीसे खोलट असून शिवलिंग स्थापित केलेले असून पाठीमागील दोन कोनाड्या दोन अप्रतिम परंतु अपरिचित मूर्ती आहेत.या मंदिराचे शिखर भाजक्या वीटांमधे गोपुर पद्धतीने बांधलेले आहे. या मंदिर समुहास देऊळवाडा या नावाने संबोधले जाते.
चतुर्मुख मंदिर (गराडे) - सासवड - नोव्हेंबर २०१९
“हे ठिकाण ब्रम्हदेवांची तपोभूमी होती. या ठिकाणी ब्रम्हदेव तप करत असताना पांडेश्वर येथे यज्ञ करीत असलेल्या पांडवांना गंगाजलाची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी गंगाजलासाठी ब्रम्हदेवाचा कमंडलू लवंडला व त्या जलप्रवाहा मधून कऱ्हा व चर्मण्वती या नद्या उगम पावल्या. मंदिराच्या उत्तर बाजूने चर्मण्वती व दक्षिण बाजूने कऱ्हा नदी वाहत जाते. कर्हे चा वाहणारा प्रवाह दरेवाडी येथून दिसू लागतो येथे काठावर कऱ्हामाईचे छोटे मंदिर आहे.”
या दोनही नद्यांचा संगम सासवड येथे होतो. त्या संगमावर संगमेश्वर महादेवाचे मंदिर आहे.
गराडे गावाजवळील दरेवाडी जवळ साधारण २ किमी अंतरावर एका उंच डोंगरावर हे मंदिर आहे. पावसाळ्यात हा परिसर निसर्गरम्य अतिशय सुंदर दिसतो. पूर्वीच्या छोट्या पूर्वाभिमुख मंदिरास नव्याने मंडप बांधला आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे. मंदिर परिसरात काही नवीन मंदिरे बांधली आहे.
या मंदिराकडे जाण्यासाठी पुण्यातून दोन मार्ग आहेत.
पहिला मार्ग पुणे-सातारा रोडवरून खेड शिवापूर-सासवड रस्त्याने पुढे गराडे गावाच्या आधी डाव्या बाजूच्या रस्त्याने वारवडी गावाकडे जाण्याचा रस्ता - त्या पुढे दरेवाडी तेथून पुढे लहानसा घाट सुरु होतो. हा रस्ता मंदिरा पर्यंत चांगला आहे.
दुसरा मार्ग पुण्यातून बोपदेव घाट मार्ग सासवड जातांना बोपदेव घाट उतरल्यावर पुरंदर धाब्याच्या पुढे उजव्या बाजूचा पठारवाडी चा रस्ता पकडावा तोच पुढे घाट चढून चतुर्मुख मंदिराकडे जातो.
सासवडजवळचे कोडित म्हस्कोबा मंदिर – पुणे आणि मुंबईजवळील ठिकाणे
एके दिवशी, मला माझ्या ब्लॉगच्या एका 70-वर्षीय अनुयायाकडून या मंदिराची शिफारस करणारा ईमेल आला. त्यांनी मला महाराष्ट्र टाइम्समध्ये मंदिराविषयी एक लेखही पाठवला होता. ते मराठीत होते आणि मला ते पूर्णपणे समजले नाही. पण, छायाचित्रावर चांगले दिसणारे कोणतेही नवीन ठिकाण भेटीसाठी चांगले असते.
तांत्रिकदृष्ट्या 2014 च्या पावसाळ्यातील हा पहिला प्रवास होता. नेहमीच, हंगामातील पहिली सहल नेहमीच मंदिरात असते. आमच्याकडे पहिल्या सहलीसाठी सहसा मोठी गर्दी असते आणि सर्वात सुरक्षित भाजक म्हणजे मंदिर. पहिल्या सहलीनंतर अनेकजण हंगामासाठी निवृत्त होतात आणि तेव्हाच चालणे आणि ट्रेक सुरू होतात.
बालाजी नारायणपूर मंदिर फक्त 10 किमी अंतरावर आहे. कानिफनाथ मंदिरही जवळच आहे. बोपदेव घाटाच्या वाटेने गेलो, कानिफनाथ ओलांडलो, मग हिवरे नंतर उजवीकडे गेलो. सासवडहूनही येऊ शकता. मगरपट्टा शहरातून कोडित मंदिराच्या मार्गासाठी खालील नकाशा पहा.
एकंदर रचना पाहता हे मंदिर बालाजी नारायणपूर मंदिरावर आधारित असल्याचे दिसते. मंदिराच्या भिंतींवर डझनभर पौराणिक कथा कोरलेल्या होत्या.
12.45 च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो आणि मुख्य मंदिर बंद झाले. त्यांनी दुपारी एक वाजता ते उघडले. मंदिरात मोफत भोजनही देण्यात आले. ही मूर्ती तुम्हाला या भागात दिसणाऱ्या विशिष्ट शैलीची होती, एकच शरीरयष्टी, केशरी (सिंदूर?) विशाल डोळ्यांनी झाकलेली होती.
मधुबन नावाचे एक रेस्टॉरंट आहे जे आपण या भागात असताना नेहमी भेट देतो. सासवडमार्गे परतताना आम्ही कधी कधी सासवडहून जेजुरीकडे जादा १० किमी चालवतो. आम्ही रात्रीच्या जेवणासाठी पुण्याहून सर्व मार्गाने गाडी चालवली आहे 🙂 हे ठिकाण अतिशय (अत्यंत) स्वच्छतापूर्ण आहे (त्यांचे स्वयंपाकघर पहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल). त्यांचे महाराष्ट्रीयन पदार्थ (जे ते फक्त जेवणाच्या वेळी देतात) खूप चांगले आहेत. त्यांच्याकडे एक लहान लॉन देखील आहे जिथे मुलांनी काही वेळ धावत घालवला. मधुबनचा नकाशा खाली दिला आहे. ही एक चांगली सहल होती जी एका चांगल्या लंचमध्ये संपली!

श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, कोडीत :-
मंदिराच्या २ एकर १ गुंठे क्षेत्रफळापैकी ५०,००० चौरस फुटात मंदिर उभारले गेले आहे. मुख्य मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णपणे दगडात बांधकाम केलेले आहे. शिखराची उंची ७१ फूट आहे. मुख्य मंदिरासमोर ४१ x ८१ फुटाचा सभामंडप असून सभामंडपासमोर १४ x १४ वाहन मंडप (नवसाई मंदिर) आहे. मंदिराचे प्रवेशद्वार – दिंडी दरवाजांची उंची ५१ फूट असून प्रवेशद्वारा खाली ३०,००,००० (तीस लाख) लीटर पाण्याची टाकी आहे.
प्रवेशद्वाराला दांडेली सागवानाचा लाकडी दरवाजा बसविण्यात आला आहे. लाकडी दरवाजावर अतिशय सुंदर असे कोरीव काम केले आहे. मंदिराच्या सभोवताली २७० x २१ फूट आणि १७१ x २१ फूट अशा ओवार्याग बांधलेल्या आहेत. ओवारीसह संपुर्ण मंदिरावर अतिशय सुंदर – सुबक नक्षीकाम करून मूर्ती बसविण्यात आलेल्या आहे. मंदिराचे काम करताना भारतातल्या बर्याच मंदिर शैलींचा वापर केला आहे. उदा. सोमपुरा शैली, दाक्षिणात्य शैली, द्रवीडी शैली, हेमाडपंथी शैली,पेशवाई शैली इत्यादी.
मंदिराचे संपूर्ण काम समस्त श्रीनाथ भक्तांच्या सहभागातून – ग्रामस्थांच्या श्रमदानातून साकारले आहे. श्रीनाथांवर अपार श्रद्धा असलेला समस्त श्रीनाथ भक्त, जर एकवटला तर तो काय करू शकतो हे पहायचे असेल तर आपणाला कोडितला यायलाच पाहिजे. कारण कोडित येथे साकारलेलं श्रीनाथांच भव्य-दिव्य मंदिर हे समस्त श्रीनाथ भक्तांच्या भावनांचे अपार श्रद्धेचे एक प्रतीक आहे. मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचा कार्यक्रम १ मे २००९ रोजी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला.
अत्यंत सुंदर देवस्थान, रविवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमेला गर्दी असते, बाकी दिवशी शांततेत दर्शन.. भव्य मंदिर व परिसर.. निवांत वातावरण, चारी बाजूंनी पक्का मंडप..गावातील महिला गाभाऱ्यात जात नाहीत, पिढ्यानपिढ्या हा नियम पाळतात.. महिलांना तशी काही आडकाठी नाही.
कोडित येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराला जाण्याचे दोन मार्ग आहेत पुणे – सासवड – कोडीत असा मार्ग आहे तसेच आपण पुणे – कापूरहोळ – केतकावळे – नारायणपूर – कोडीत या मार्गाने ही जाऊ शकता.
हिवरे :-

बोकील कुटुंब हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगांव कुमठे येथील रहिवासी परंतु चौदाव्या शतकात यांचा मूळपुरूष सिध्देश्वरभट हे क-हेपठारावर येऊन राहू लागले व उपाध्यायाची वृत्ति चालवू लागले. अशा या सिध्देश्वरभटाचे पणतू गोपीनाथपंत बोकील यांचे बुद्धीकौशल्याचे कर्तृत्व अफजलखान प्रसंगी इतिहासाने पाहिले आहे. शिवकाळात सुरवातीचे सर्वात मोठे संकट म्हणजे सन १६५९ साली विजापूरच्या आदिलशाचा मातब्बर सरदार अफजलखानाचे होते, त्या प्रसंगी महाराजांचे निष्ठावान वकील म्हणून यशस्वी कामगिरी बजावणारे गोपीनाथपंत बोकील हे पुरंदर तालुक्यातील हिवरे या गावचे होते. गोपीनाथपंत हे सिध्देश्वरभट बोकीलांचे पणतू. त्यांच्यानंतर बोकील कुटुंबातील इतिहासात स्वकर्तृत्वाने प्रसिद्धीस आले ते सखारामबापू. गोपीनाथपंत यांच्या यमाजी नामक भावाचे पणतू म्हणजेच सखारामबापू भगवंत बोकील. सासवड मधील बोकील यांचा पडझड झालेला वाडा पाहताना पेशवाईत प्रसिध्द असलेल्या साडेतीन शहाण्यापैकी एक असलेल्या सखाराम भगवंत या मुत्सद्याचा कालखंड डोळ्यासमोर उभा राहतो. हे सखारामबापू देखील हिवरे गावचे गावकुलकर्णी. त्यांनी हिवरे गावाच्या शेजारुन वाहणाऱ्या चरणावती नदीच्या तीरावर त्र्यंबकेश्वर मंदिराची निर्मिती केली होती, ते प्रेक्षणीय मंदिर आजही आपले वैभव सांभाळून दिमाखाने उभे आहे. अशा या कर्तृत्वान सखारामबापूंचा पेशव्यांशी पहिला संबंध आला तो प्रसंगही विलक्षण असाच होता. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे सासवडला राहत होते. पेशवे आणि पुरंदरे या दोन घराण्यांचा स्नेह त्याकाळापासूनचा. दोन्ही घराण्यातील कर्तृत्वान पुरुषांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केलेली. बाजीराव बाळाजी पेशवे हे सुरूवातीला सासवडला राहत होते. बाजीराव साहेबांना भोजनात तीळाची चटणी फार प्रिय असायची हे महादजी पुरंदरेंना ज्ञात होते. परंतु एकदा ते जेवायला आले असताना त्यांच्या ताटात तीळाची चटणी नव्हती, ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यावेळी तेथे पंगतीला जेवण वाढणारा पुरंदरेचा शार्गीद असलेला पोरसवदा मुलगा होता, तो म्हणजे सखारामबापू बोकील. प्रसंग पाहून तो पेशव्यांना म्हणाला," सरकार आज आदित्यवार (रविवार) आहे. या दिवशी तीळ, मधु, मांसाहार व स्त्री या गोष्टी वर्ज्य असतात. " हे बाणेदार उत्तर ऐकून बाजीराव पेशवे प्रसन्न झाले आणि सखारामबापूचा पेशवाईशी संबंध जोडला गेला. पेशव्यांनी त्यांना हिवरे गावचे कुलकर्ण्य दिले तर महादजी पुरंदरे यांनी कारकुनी पदावर त्यांना नेमले. पुढे शनिवारवाडा बांधकाम १० जानेवारी १७३० सुरू झाले तेव्हा सखारामबापूंनी वाड्याच्या कुलकर्णीपणाचे काम अतिशय चोखपणे केले आणि पेशव्यांची मर्जी संपादली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या बुद्धीकौसल्याने अतिशय वेगाने प्रगती केली. नानासाहेब पेशवे यांच्या अनेक मोहिमात ते एक महत्त्वाचे सरदार म्हणून आघाडीवर असायचे. रघुनाथरावदादांनी उत्तरेची मोहिम आखली तेव्हा त्यांच्या समवेत ते होते. इ. स. १७५४ मधे सुरजमल जाट याच्याकडून खंडणीसाठी त्याच्या कुंभेरच्या किल्ल्यास रघुनाथरावदादा पेशवे, मल्हारराव होळकर व जयाजी शिंदे यांच्या सैन्याने वेढा दिला. या दरम्यान तोफेचा एक गोळा लागून मल्हाररावांचे पुत्र खंडेराव मरण पावले. मल्हाररावांना आपल्या मुलाच्या मृत्यूने अतिशय शोक झाला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली, की " सुरजमलचा शिरच्छेद करून कुंभेरची माती यमुनेत टाकीन तरीच जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राणत्याग करीन." ही मल्हाररावांची प्रतिज्ञा सुरजमलच्या कानावर गेल्यावर तो घाबरला. त्याने आपली पगडी काढून ती जयाजी शिंदे यांच्या छावणीत पाठविली आणि पत्र दिले, " आजचे समयी तुम्ही वडील बंधु, मी धाकटा, कळेल त्या रीतीने बचाव करावा." शिंद्यांनी त्यांची विनंती मान्य केल्याने मल्हारराव काहीसे बिथरले. दोन मात्तबर मराठा सरदारांच्यात बेबनाव होणे हे पेशवाईसाठी चांगले नव्हते. अशावेळी सर्वकाही सुरळीत करण्यात सखारामबापूंची शिष्टाई फार मोलाची ठरली आणि सखारामबापू हे रघुनाथरावदादांचे खाजगी कारभारी झाले. त्यांनी पेशवाईसाठी अतिशय कष्ट घेतले व रघुनाथरावदादांचे निष्ठावान झाले. माधवराव पेशवेपदी असताना, त्यांना सखारामबापू हे अप्रिय होते, असे असूनहि ते महत्त्वाचे प्रसंगी त्यांचा सल्ला घेत यावरून त्यांचे महत्त्व किती होते हे दृष्टिपथास येते. मात्र नारायणराव पेशव्यांचा शनिवारवाड्यात खून झाल्यावर ते काहीसे बिथरले. त्यांनी रघुनाथरावदादांचा पक्ष सोडला आणि बारभाईचे नेतृत्व घेतले. पेशवाईच्या वर्चस्वासाठी झालेल्या गृहकलहात ते एका गटाचे प्रमुख झाले. नारायणराव पेशव्यांच्या गरोदर पत्नीला सुरक्षितेसाठी त्यांनी पुरंदर किल्यावर ठेवले. इ. स.१७७४ मधे नारायणराव पुत्र सवाई माधवराव या बालकाच्या नावाने पेशवाईची वस्त्रे सातारा छत्रपति यांच्याकडून त्यांनी आणली. उत्तरपेशवाईत अतिशय नावारुपाला आलेला हा मुत्सदी अनेक आरोपांचा धनी झाला. त्यांचा एकुलता एक मुलगा अंकोपंत याचे लग्न १ जानेवारी १७६७ रोजी भोर संस्थानचे अधिपति श्रीमंत रघुनाथ चिमणाजी पंतसचिव यांच्या गोदूबाई नामक मुलीशी सासवड मुक्कामी झाले. हा विवाह सोहळा सुमारे दोन महिने चालला होता. सखारामबापूंची मुलगी भोरच्या पंतसचिव घराण्यातील शंकरराव रघुनाथ यांस दिली होती. हा विवाह सोहळा सातारा जिल्ह्यातील वाई येथे २४ जानेवारी १७७९ रोजी संपन्न झाला होता व या लग्नप्रीत्यर्थ बापूंनी ४० हजार रुपये खर्च केले होते. सखारामबापूंचा एकुलता एक मुलगा आकोपंत मे १७७५ मधे निधन पावला. उतार वयात घराण्याला वारस राहिला नाही. काळ फिरला होता, पेशवाईत ज्याच्या शब्दाला फार मोठा मान होता, तो सखारामबापू कैदेत पडला. महादजी शिंद्यांनी चाळीस शेर वजनाची चांदीची बेडी त्यांच्या पायात टाकली. २ आॕगष्ट १७८२ रोजी रायगड किल्ल्यावर कैदेत असताना पेशवाईतील एका शहाण्याचा अंत झाला.

हिवरे गावच्या रस्त्याच्या कडेला दोन दुर्लक्षित दगडी समाधि सदृश्य वास्तू आहेत, त्यापैकी एक लहान व एक मध्यम आकाराची आहे. या दोन्हीही वास्तू जर समाधिस्थळ असतील तर नक्कीच त्या गोपीनाथपंत व सखारामबापूंच्या असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा या पेशव्यांचे कारभारी असलेल्या सखारामबापूंचे स्मरण ही वास्तू पाहताना होते.
पुणे- सासवड रोडवर ( बोपदेव घाट ) या मार्गावर हिवरे हे गाव आहे. मंदीराच्या समोर ओढा आहे. चार ही बाजुने तटबंदी असून त्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. आत मुख्य मंदीर तसेच सोबत मारुती आणि गणपती मंदीर आहे. मंदीरासमोर दीपमाळ आहे आणि नंदी आहे. शिखर पेशवाई शैलीतील वाटते, यावरुन हे मंदीर १७ व्या किंवा १८ व्या शतकातील वाटते. इथला परिसर अतिशय प्रसन्न आहे.

हिवरे गावातील वीरगळ –
त्या वरच्या भागात दोन अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन जातानाचा प्रसंग कोरण्यात आलेला आहे.अप्सरा चवरीधारी असून विराने त्यांच्या खांद्यावर आपला एकेक हात ठेवलेला आहे. त्या वरच्या भागात वीर शिवलिंगाची पूजा करतानाचा प्रसंग आहे. युद्धात वीरगती प्राप्त झाल्यानंतर वीर श्री महादेवाच्या जवळ पोहोचल्याचे हे निदर्शक आहे. शिवलिंग आणि सोबत नंदी दाखवलेला असून, वीर शिवलिंगासमोर हात जोडून बसलेला आहे. स्वर्गातील पुजारी हातात घंटा आणि बिल्वपत्र घेऊन विराकडून ही पूजा करवून घेत आहे. विरगळीच्या सर्वात वरती मोक्ष प्राप्तीची खूण म्हणून कलश कोरलेला आहे.
डोक्यावरील पगडीला दोन्ही बाजूंना असलेली गाठ आणि दोन्ही पायांमधून जमिनीला स्पर्श करणारा धोतराचा त्रिकोणी पट्टा ही शुंग कालखंडातील शिल्पांतील पुरुषांची वेशभूषा असते, हाच कपड्यांचा नियम इथं लावल्यास ही वीरगळ इसवी सनपूर्व १८५ ते ७५ या काळातील असावी असाही अंदाज बांधला जाऊ शकतो.हिवरे गावातील वीरगळ.
डोक्यावरील पगडीला दोन्ही बाजूंना असलेली गाठ आणि दोन्ही पायांमधून जमिनीला स्पर्श करणारा धोतराचा त्रिकोणी पट्टा ही शुंग कालखंडातील शिल्पांतील पुरुषांची वेशभूषा असते, हाच कपड्यांचा नियम इथं लावल्यास ही वीरगळ इसवी सनपूर्व १८५ ते ७५ या काळातील असावी असाही अंदाज बांधला जाऊ शकतो.
कानिफनाथ मंदिर :-








![]() |
| मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार |

आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला,
गोरक्ष वदला गहिनीप्रति
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार
ज्ञानदेवे सार चोजविले
रसवंती गृहांच्या नावाच्या मागचा इतिहास -
मस्तानी तलाव :-


संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) स्थापत्य- महाराष्ट्र शासन
३) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के. घाणेकर
४) इये महाराष्ट्र देशी- प्र.के. घाणेकर
५) आव्हान - आनंद पाळंदे
६) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
७) https://www.marathibuzz.com/baji-pasalkar
८) https://www.discovermh.com
९) https://m.facebook.com
१०) https://www.garvanemarathi.com
११) http://theroyaljagtap.blogspot.com
१२) https://historicaltouch.com
१३) https://mr.vikaspedia.in
१४) https://www.marathisrushti.com
१४) पेशवे दप्तर
१५) मराठी दप्तर रूमाल - १ व २
१६) पेशवे बखर
१७) पुरंदरे दफ्तर
१८) मराठ्यांच्या इतिहासाची साधने - राजवाडे खंड
१९) रोजनिशीतील उतारे
२०) शाहू बखर
२१) आंगरे यांची हकीकत
२२) ब्रम्हेंद्र-चरित्र
२३) साधन परिचय
२४) पेशवेकालीन महाराष्ट्र
२५) मराठी रियासत
२६) अप्रकाशित कागदपत्र
२७) पेशवे घराण्याचा इतिहास
२८) श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक. यांचे लिखाण
२९) https://www.maayboli.com
३०)पुरंदरे कृ.वा.- पुरंदरे दप्तर भाग १,२ २) सरदेसाई गो.स.- मराठी रियासत खंड ३,४
३१) दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती, यादी वगैरे
३२) https://hdheritagewalks-in.translate.goog
३३) https://susheelrajagolkar.blogspot.com
नवनाथांपकी एक अडबंगनाथ यांचे मंदिर आळंदी जवळ डुडुळगाव येथे इंद्रायणी नदीजवळ आहे. असे सांगितले जाते कि डुडुळगावचे मूळनाव अडुळगाव होते व इथे अडबंगनाथ महाराज यांनी १२ वर्षे तप केले ! हे मंदिर आडबाजूला असून गावठाणाच्या शांत भागात आहे. या मंदिराला जरूर भेट द्यावी असे आहे,आपणास वेगळाच प्रसन्न अनुभव इथे येतो.
३०० वर्षे जुन्या मस्तानी तलावाचं नाव कसं पडलं? काय आहे यामागची रंजक कथा ?
पुण्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मस्तानी तलाव काठोकाठ भरला व याच्या बातम्या यायला सुरूवात झाली. ३०० वर्षे जुन्या या तलावाचे नाव मस्तानी तलाव कसे पडले याची एक चुरस कथा सांगितली जाते. मस्तानी तलावाचे ऐतिहासिक महत्व असून त्याचा भविष्यकाळही आशादायक आहे. जवळच्या खेड्यांमध्ये मुख्य जलस्रोताच्या प्रणयाचे प्रतीक म्हणून पुण्यातील मस्तानी तलावाला ओळखले जाते. तर जाणून घेऊया मस्तानी तलावाविषयीची रंजक कथा..
इ.स. १७२० मध्ये मस्तानी तलावाची निर्मिती करण्यात आली. याला एक आकर्षक इतिहास जोडलेला आहे. पूर्वी या तलावाला वडकी तलाव म्हणून संबोधले जात होते. पहिले बाजीराव पेशवे आणि मस्तानी हे दोन लव्ह बर्ड्स या ठिकाणी येत होते. त्यानंतर तलावाला मस्तानी तलाव म्हणण्यात आले. हे तलाव मस्तानीच्या अंघोळीचे ठिकाण मानले जात असे.

मस्तानी तलाव
असे मानले जाते की, पुण्याच्या बाहेरील तलावाला बाजीराव पेशवे आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांनी घोडेस्वारी करताना वारंवार भेट दिली होती. ते अनेकदा थांबून तलावात पोहायचे. बाजीरावांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी तलावाभोवती भिंती बांधण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या निधनानंतर लगेचच मस्तानीनेही अखेरचा श्वास घेतला. बाजीराव व मस्तानीने तलावाच्या भिंती पूर्ण झाल्याचे पाहिले नाही. आणि ते बांधल्यानंतर ३०० वर्षांनंतरही,तलाव आणि बाजुच्या भिंती काळाच्या कसोटीवर टिकल्या आहेत. मस्तानी तलाव आज एक रोमँटिक स्पॉट झाल आहे आणि येथे प्रेमीयुगुलांची नेहमी वर्दळ असते.
मस्तानी तलाव तब्बल १४ एकर क्षेत्रात पसरलेला असून बाजूच्या हिरव्यागार टेकड्यां तलावाच्या आकर्षकपणात भर घालतात. हे एक नयनरम्य ठिकाण आहे. मस्तानी तलाव हे पिकनिकर्स आणि कॅम्पिंग प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. तलावाभोवती दोन मंदिरे आहेत आणि बाजुच्या हिरव्यागार शेतातून ससे,हरीण आणि मोर दृष्टीस पडतात. येथे कॅमेरे काढून यांचे सौंदर्य टिपण्याचा मोह आवरता येणे कठीण आहे.
मस्तानी तलाव
२०१८ मध्ये, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या तलावाचे पुनरुज्जीवन केले. या तलावाचे उत्खनन करण्यात आले जेणेकरून त्याची जलाशयाची क्षमता वाढेल व आजूबाजूच्या गावांसाठी जलस्रोत ठरू शकेल. या ऐतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. पुण्याकडून सासवडकडे जाताना हडपसरच्या पुढे दिवे घाटापर्यंत गाडीतून जाताना तुम्ही तलावाचे व पक्ष्यांचे वैभव पाहू शकता. तलावाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात असतो, जेव्हा तलाव निळ्या पाण्याने भरलेला असतो आणि त्याच्या सभोवतालच्या टेकड्यांचे हिरवेगार लँडस्केप एक पूरक कॉन्ट्रास्ट देते.
मस्तानी तलावाच्या नावाचा इतिहास प्रकाशात
म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिवेघाटाजवळच्या तलावाला ‘मस्तानी तलाव’ हे नाव कसे पडले, याची रंजक माहिती समोर आली आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात सुमारे २५० वर्षांपू्र्वीच्या नोंदींचा कागद इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे आणि भास्वती सोमण यांना मिळाला असून, त्यात ‘मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला’ असा उल्लेख त्यात आहे.
अनेक स्थळांची नावे पूर्वापार रूढ असतात. मात्र, त्या स्थळांना ती नावे का व कशी देण्यात आली, याचा इतिहास अनेकदा माहीत नसतो किंवा तो विस्मृतीत गेलेला असतो. मस्तानी तलावही त्यापैकीच एक आहे. आजही मस्तानी तलावाविषयी विशेष काही माहिती उपलब्ध होत नाही. इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे व भास्वती सोमण यांना मस्तानी तलावाबाबत माहिती देणारी नोंद सापडली. मंडळातील दिवंगत अभ्यासक पांडुरंग पटवर्धन यांनी मंडळात आणलेल्या कागदांपैकी हा कागद असून, तो ‘याद’ या प्रकारात मोडणारा आहे. अशा प्रकारच्या कागदांमध्ये घडून गेलेल्या घटना नोंदवून ठेवलेल्या असतात.
'मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला' असा संदर्भ या नोंदीत सापडतो. बाजीराव पेशवे यांनी दिवे घाटाखाली तलाव बांधला आणि बाग तयार करून मस्तानीकडे सोपवण्यात आली अशी माहिती या नोंदीतून कळते. तेव्हापासून या तलावास मस्तानीचे नाव पडले असावे. नोंदीत उल्लेखलेल्या बागेचा मागमूसही आताच्या तलावानजीक सापडत नाही. या तलावाच्या जवळ शिवमंदिर व तटावर गणेशमंदिर आहे. गणेशमंदिर माधवराव पेशव्यांनी बांधले आहे. मात्र, शिव मंदिराची नोंद उपलब्ध नाही. पुढील काळात बाजीरावाचे चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी तलावात पाणी किती आहे हे पाहण्यास माणसे पाठवल्याचे पत्रही प्रकाशित आहे. याच कागदामध्ये नानासाहेब पेशवे यांनी नीरा नदीस मौजे पिंपरड येथे लाकडी पूल बांधल्याचीही नोंद असल्याचे लवाटे यांनी सांगितले.
तलावात प्रचंड गाळ
मस्तानी तलावाची पाणी साठवण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, त्यात प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. २००३मध्ये एकदा गाळ काढण्यात आला होता. मात्र, तो जेमतेम दहा टक्केच होता, असेही लवाटे यांनी सांगितले.
दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला मस्तानी तलाव पेशव्यांच्या इतिहासाच्या खुणा जपतोय
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पुणे शहराच्या आजूबाजूला अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी कायम खुणावत असतात. अशाच काही ऐतिहासिक ठिकाणांपैकी पुण्यापासून अगदी जवळ आणि दिवे घाटाच्या पायथ्याला एक तलाव आपल्याला पहायला मिळतो. हा तलाव आपण दिवे घाट चढताना कायम पाहत असतो पण फार कमी लोकं या ऐतिहासिक तलावाला भेट देत असतात. हा ऐतिहासिक तलाव ‘मस्तानी तलाव’ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे.
पुण्यामधून आपण ‘सासवड’ कडे जाऊ लागलो की साधारणपणे २० कि.मी अंतरावर दिवेघाटाच्या अलीकडून एक रस्ता आपल्याला ‘वडकी’ या गावापर्यंत घेऊन येतो. पूर्वी याठिकाणी जाण्यास जवळपास ३ किलोमीटर पायपीट करावी लागत असे, आता रस्ता झाल्याने जाणे देखील सुकर झाले त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही उत्तम. दिवे घाटाच्या पायथ्याशी बांधलेला ‘मस्तानी तलाव’ आजही आपल्या इतिहासाच्या खुणा जपून आहे.

तसे पहायला गेले तर हे पेशवे काळातील एखादे छोटे धरण असावे, कारण याची नीट रचना आपण पाहिली तर याला एक बंधारा आपल्याला पहायला मिळतो. दिवे घाटाच्या डोंगरातून पावसाचे पाणी येऊन हे सगळे पाणी या बंधाऱ्यामध्ये साठवले जाते. या बंधाऱ्याला सुंदर कामान देखील आहे. साधारणपणे जवळपास ६ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास १५ फुट आहे.
या तलावाच्या पश्चिमेस आपल्याला तीन बुरुजांचे बांधकाम पहावयास मिळते. तसेच ‘मस्तानी तलाव’ याच्या काठावर एक गणपतीचे मंदिर देखील आहे.
या गणपतीच्या मंदिरातील मूर्ती अत्यंत सुरेख आहे. तसेच ‘मस्तानी तलावा’च्या भिंतीवरून थोडे चालत गेले असता आपल्याला एक शिवलिंग देखील पहायला मिळते. या तलावाच्या इथे आपल्याला एक भुयाराचे तोंड देखील पहायला मिळते. या सुंदर ‘मस्तानी’ तलावाजवळ आपल्याला एक शिवमंदिर आणि हनुमानाची मूर्ती देखील पहायला मिळते.
मस्तानी तलावाच्या बांधकामासंबंधात आपल्याला एक ऐतिहासिक पत्र मिळते ते पत्र पुढीलप्रमाणे:-
‘सेवेसी जगन्नाथ नागेश विज्ञापना ऐसिजे. छ. १२ मोहरमी सेवेशी विनंती हेच की, पहिले पूर्वी नक्षत्राचे पाणी, लांबी उत्तर दक्षिण तिही बुरुजांमध्ये सुमारे १०० हात व रुंदी पूर्ण पश्चिम अशी नव्वद व खोली कोठे तीन हात, कोठे चार हात येणे प्रमाणे होते. पुढे उत्तराचे दोन-तीन पाऊस बरेच पडले. पूर्वेकडील दोन्ही खोल्यांतील ओढे व दक्षिणेकडील कळ्याचे पालीबाहेरील ओढे जिले वाहो लागले. ते खणोन बांधोन आणून तळ्यात आणिले आहेत. सदरहू लिहिण्याप्रमाणे लिंगोजी निंबोणकर व कुसाजी गायकवाड यांनी आपले नजरेने पाहिले’.

तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी हा ‘मस्तानी तलाव’ बांधून घेतल्यावर पुढे नानासाहेब पेशवे यांच्या काळामध्ये इ. स. १७५१ मध्ये या तळ्यासाठी काही रक्कम खर्च केल्याचे ‘नानासाहेब पेशवे’ यांच्या रोजनिशीमध्ये दिलेले आहे.
‘मस्तानी तलाव’ हे नाव कसे पडले या संबंधीत २५० वर्षांपूर्वीचा एक महत्वाचा कागद पुण्याच्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ येथे इतिहास संशोधक ‘मंदार लवाटे’ आणि ‘भास्वती सोमण’ यांना सापडला असता त्यामध्ये एक नोंद त्यांना मिळाली त्या नोंदीमध्ये जो उल्लेख येतो तो पुढीलप्रमाणे:-
‘मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला’
‘बाजीराव पेशवे’ यांनी दिवे घाटाखाली तलाव बांधला आणि बाग तयार करून ‘मस्तानीकडे’ सोपवण्यात आली अशी माहिती या नोंदीतून कळते. तेव्हापासून या तलावास मस्तानीचे नाव पडले असावे. या नोंदीमध्ये असलेल्या बागेचा आज कोठेही पत्ता मात्र लागत नाही. मात्र हे स्थळ अजूनही उपेक्षित आहे.

मुळातच ‘दिवेघाट’ आणि ‘सासवड’ या परिसरात पाऊस खूप कमी पडतो तसेच या तलावातील गाळ मध्यंतरी काढला होता परंतु परत तो साचला आहे. त्यामुळे या तलावात जेव्हा जोरदार पाऊस पडतो तेव्हा हा ‘मस्तानी तलाव’ पाण्याने भरतो अन्यथा हा तलाव कोरडा असतो. मध्यंतरी जोरात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरलेला होता. ‘मस्तानी तलाव’ संपूर्ण पाण्याने भरल्याचे वृत्त देखील काही वृत्तपत्रांमधून झळकले होते. असा हा ‘वडकी’ गावाजवळील सुंदर ‘मस्तानी तलाव’ नक्कीच भेट देण्यासारखा आहे!
१) बाळाजी बाजीराव पेशवे रोजनिशी:- ग. चि. वाड, इंदूप्रकाश प्रेस, १९०६.
कसे जाल:-
१) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
२) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा की त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या पाऊलखुणा ठेवाव्यात.
४) धबधब्यामध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
https://thepostman.co.in/mastani-talav-pune-historic-place-in-pune/
![]() |
| दिवे घाटातुन सूर्यास्त व मस्तानी तलाव - सासवड |
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज
श्री क्षेत्र नारायणपूर
दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
नारायणपूरला पोहचल्यावर गाडीतळावर गाडी लावून दर्शन घेण्यासाठी गेलो. ऐव्हाना दुपारचे दीड वाजले होते. प्रवचन सुरू होते. प्रवचनानंतर आरती सुरू झाली. काही भक्तांच्या अंगात येणे हा प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतो. सुमारे अर्धा तास तरी हा प्रकार सुरू असतो. कोणी श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा पण हा प्रकार अवघडच आहे. असो. श्री दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते. श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. सोहळ्यासाठी नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते. प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत. संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते. मंदिरा शेजारी नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने मंदिर आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर आहे.
नारायणेश्वर मंदिर
पुण्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्याच्या पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर. येथेच प्रसिद्ध असा एकमुखी दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे. दत्त मंदिरा शेजारी असलेल्या या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिर आहे. मंदिर यादवकालीन आहे.
मंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिरा भोवती अंदाजे ५ ते ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात आपला प्रवेश होतो.
नारायणपूरचे मूळ नाव पूर. यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे आहेत. मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झाल्याचे दिसून येते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती आहे.
हे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरुपात असते तर अधिकच छान दिसले असते. मात्र, रंगरंगोटी करून त्याची लया घालावली आहे. मंदिराचा असला जिर्णोद्धार काय कामाचा. असो, सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षी आहे.
या दरवाजासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात. मात्र, या तलावाची योग्य निगा राखली गेली नसल्याचे दिसून येते. शंकर भगवानचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र दत्त संस्थातर्फे देण्यात येणारा मोफत प्रसाद खाण्यास गेलो.
पोटभर प्रसाद
श्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. मी व माझे मित्र पूर्वी पुरंदरावरून दुपारी ३ पर्यंत खाली उतरून आल्यावर दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पोटभर प्रसाद खात असे. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.
एक दिवस वेळ काढून नक्कीच नारायणपूर व परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देता येईल असा हा सर्व परिसर आहे.
पुरंदर किल्ला
नारायणपूरला मंदिरामागे पुरंदर किल्ला आहे. या पुरंदरावर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध पुरंदरचा तह, मुरारबाजींचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराज, सवाई माधवराव यांचे हे जन्मस्थान. पुरेसा वेळ असल्यास नक्कीच या किल्लयावर जाऊ या. पुरंदर गडावरून सर्वच परिसर मोठा सुरेख दिसतो. येथे जाण्यासाठी मुख्य मंदिराकडे येतानाच रस्ता आहे. या विषयी पुन्हा कधीतरी.
कसे जाल :
नारायणपूरला पुण्याहून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक तर कापूरओव्हळ मार्गे बालाजी दर्शन घेऊन नारायणपूरला येता येते. दुसरे हडपसर मार्गे दिवेघाटातून नारायणपूरला येता येते. तसेच बापदेव घाटातूनही येता येते.
- स्वारगेट > कापूरओव्हळ (२५ किमी पुणे - सातारा रस्त्यावर) > नारायणपूर मंदिर (१५ किमी)
- सासवड > नारायणपूर अंतर १२ किमी आहे.
- स्वारगेट > नारायणपूर अशी एसटी सेवा उपलब्ध आहे.
- स्वारगेट > हडपसर मार्गे सासवड ३० किमी अंतर > नारायणपूर मंदिर (१० किमी)
अजून काय पहाल :
प्रति बालाजी मंदिर (कोपूरओव्हळ)पांडेश्वर मंदिर
भुलेश्वर मंदिर
पुरंदर, व्रजगड किल्ला
कानिफनाथ मंदिर
पुरंदर- वज्रगड किल्ला
संगमेश्वर मंदिर
नारायणेश्वर मंदिर
वटेश्वर मंदिर
बालाजी विश्वनाथ यांची समाधी
मल्हारगड
जेजुरी
पूरचा नारायणेश्वर
पूर गाव सासवडपासून तसं १०/१२ किमी अंतरावर. गावात जाताना पुरंदर किल्ला
सतत नजरेसमोर राहात असून जवळजवळ येत असतो. ह्याच गावात आहे नारायणेश्वराचं
सुंदर देऊळ.
माझ्या अंदाजाप्रमाणे संगमेश्वर आणि वटेश्वरापे़क्षाही हे अधिक प्राचीन
आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शैव द्वारपालांवरुन हा निष्कर्ष काढता
येतो.
ह्याही मंदिराच्या बाह्यभिंतीवर तसेच सभामंडपातही शिल्पे नाहीत. जी काही मोजकी शिल्पे आहेत ती मंदिराच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालांच्या रुपात आणि गाभार्याच्या द्वारपट्टीकेवरील भैरवांच्या रुपात आणि ह्याखेदीज नटराज शिवाचे एकमेव शिल्प येथे आहे.
मंदिराचं आवार विस्तृत आहे. आवारातच एका ठिकाणी चपेटदान मुद्रेतल्या वीर मारुतीची मूर्ती ठेविली आहे. हा मारुती शिवकालीन आहे.
वीर मारुती
नारायणेश्वर मंदिर
काही भग्न स्तंभ आणि द्वारचौकट
द्वारचौकटीवर दोन्ही बाजूसं शैव प्रतिहारी आहेत. कडेच्या बाजूस असणार्या मूर्तीच्या हातात लआंबटसर अशी पिशवी दिसते. ह्याचा अर्थ हे मंदिराच्या बांधकामासाठी धन आणत आहेत असा होतो.
नटराज शिव
द्वारचौकटीवरील नक्षीकाम
सभामंडप हा पुष्कळ स्तंभांवर तोललेला आहे मात्र ह्या स्तंभांवर शिल्पे नाहीत शिवाय नक्षीसुद्धा नाही.
गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस असलेले भैरव द्वारपाल अतिशय देखणे आहेत. एकाच्या हाती त्रिशुळ आणि डमरु आहे तर दुसर्याच्या हाती डमरु आणि नाग आहे.
----
गाभार्याचं कमळाच्या आकृतीत कोरलेलं नक्षीदार छत
मंदिराच्या दगडी बाह्यभिंती अतिशय सुंदर दिसतात. भिंतीत काही ठिकाणी देवकोष्ठे केलेली दिसतात पण ह्यात आज मूर्ती नाहीत.
ह्याच मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडे शेतात काही सतीशिळा
दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या आहेत. त्यातली एक सतीशिळा तर कमालीची देखणी
आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या सतीशिळेवर सतीचे चार हात कोरलेले आहेत.
ह्याचा अर्थ चार वेगवेगळ्या वीरपत्नी येथे सती गेल्यात असा होतो. एकाच
वीराच्या चार पत्नी सती जाणे हे संभवनीय नाही.
सतीच्या हातांखाली युद्ध करण्यार्या वीराचा प्रसंग कोरलेला आहे. व त्याचे
खाली चार वीरपत्नी प्रार्थना करताना दाखवलेल्या आहेत. सर्वात खालच्या
प्रसंगात चितेवर बसून सती जाणार्या स्त्रीचा प्रसंग कोरलेला आहे. व सर्वात
वरच्या पट्टिकेवर ह्या स्त्रीया कैलासास जाऊन शिवलिंगाची आराधना करताना
दाखवलेल्या आहेत.
ह्याच सतीशिळेच्या जोडीला वीरमारुतीची एक मूर्ती आहे.
ह्याच्या समोरच शेतात असलेली एक दुर्लक्षित सतीशिळा.
ही झाली सासवडच्या काही प्राचीन मंदिरांची थोडक्यात ओळख. अजूनही काही प्राचीन मंदिरे ह्या परिसरात असतील. थोडा शोध घेतला पाहिजे. पण सासवडच्या आसपासचा परिसर हा प्राचीन अवशेषांनी अगदी वेढलेला आहे. ह्याच्या आसपासच्या नाझरे, माळशिरस, नायगाव ह्या लहानशा गावांमध्ये असणारे कित्येक वीरगळ, सतीशिळा, काही मोडलेली मंदिरे, काही अजूनही शाबूत असणारी पण मूळचे सौंदर्य हरवलेली मंदिरे मी हिंडून पाहिली आहेत त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
एकमुखी दत्तमंदीर श्री क्षेत्र नारायणपूर – डिसेंबर २०१८
नारायणपूर, पुरंदर किल्ला 🏰, चांगावटेश्वर मंदिर🛕, सासवड, मल्हारगड ०७-मे-२०२२
नारायणेश्वर मंदिर | Discover Maharashtra

नारायणेश्वर मंदिर – नारायणपूर
नारायणपूर हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. याच गावात प्राचीन नारायणेश्वर मंदिर गतवैभवाची साक्ष देत आजही उभ आहे.
पुणे बंगलोर हायवरील कापुरहोळ गावापर्यंत आल्यानंतर हायवे सोडून कापूरहोळ – सासवड रस्ता पकडावा. याच रस्त्यावर साधारण ३.५ किमीवर बालाजीचे प्रसिध्द मंदिर आहे. पुढे १५ किमी वर नारायणपूर गाव आहे.
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या प्रसिद्ध नारायणपूर गावात हे प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे. रस्त्याला लागुन असलेल्या नारायणेश्वर मंदिरा भोवती ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात प्रवेश करता येतो.
नारायणेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरा बाहेरील सभामंडप कोसळलेला आहे. या सभामंडपाचे खांब शाबूत आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मुर्ती आहे. मंदिराच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. व्दारपट्टीच्या मधोमध गणपती आहे. दरवाजाच्या दोनही बाजूस २ फूट उंचीच्या गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे.
मंदिरात प्रवेश केल्यावर पितळेचा नंदी दिसतो.
मंदिराच्या आतील सभामंडप ४ मोठ्या दगडी खांबांवर तोललेला दिसतो. या
खांबांच्या मधोमध असलेल्या दगडी जमिनीवर मोठे कासव कोरलेले आहे.
मंदिरातील गाभार्याीच्या दरवाजा बाहेर दोन ५ फूटी अप्रतिम मुर्ती कोरलेल्या
आहेत.हे दोन्ही शंकराचे गण आहेत. दिसायला या दोनही मुर्ती जरी सारख्या
असल्या तरी त्यात एक छोटासा फरक आहे. एका मुर्तीच्या तोंडातून त्याचा सुळा
बाहेर आल्याच दाखवण्यात आलेले आहे. सुळा बाहेर आला आहे तो “राक्षस” गण असून
दुसरा “देव” गण आहे. गाभार्याहच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले
आहे.
गाभार्याषत उतरल्यावर काचेखाली दगडात कोरलेले एक मोठा वर्तुळाकार
खड्डा दिसतो. त्याच्या आतमध्ये यांच्या तीन स्वयंभू पिंडी आहेत. त्यांना
ब्रम्हा, विष्णू व महेश म्हणतात.
उपेक्षित पाणपोई ?
( क्रमांक ६८ )
बनेश्वर महादेव मंदिर - जुलै २०१९
बनेश्वर धबधबा आणि वन उद्यान - जुलै २०१९
We spend around an hour in the temple area and left for the drive. We took a small route which is just before Changa Vateshwar temple. Route change very scenic and full of curved in the lap of Sahyadri. We drive till Panvadi village. There is no huge waterfall but you can see some beautiful landscapes. You will not find any hotel in this area hence better to carry own food. After spending more than 2 hours on that route, we returned to Saswad-Bhor road.
| Road to Panvadi Village |
| Green Nature |
| Panvadi Village |
| Necklace River Point, Bhor |
- Prati Balaji Temple at Ketkawale
- Purandar Fort
- Sonori Fort near Saswad
- Mastani Lake
- Baneshwar Temple and Baneshwar waterfall
सासवडचीये नगरी: लोणी भापकर
आता बारामती हायवेला लागलो. आणी सुसाट सुटलो.लोणी भापकरला वळण्याचा रस्ता
चुकायला नको म्हणून MAP लावला आणी निघालो. येथून पुढे सुमारे २ वाजता
पोहोचलो लोणी-भापकर.
लोकप्रभा मध्ये आलेला अभिजित
बेल्हेकर यांचा लेख वाचूनच लोणी भापकर ला जायचे नक्की केले होते.
मोरगाव-बारामती रोड वरून एकदाचा "लोणी भापकर" फाटा दिसला आणी हुश्श केले.
सुर्य डोक्यावर आलेला आणी पोटातही डोंब उसळलेला. फाट्यापासून सुमारे १५-२०
मिनिटे गाडी हाकत गेल्यावर गावात पोहोचल्याचे सुतोवाच झाले. जरा वर्दळ दिसू
लागली आणी त्यातच एका मंदिराचा कळस अगदी दूरवरूनही लक्ष वेधून घेत होता.
तेच हे काळभैरवनाथ मंदिर.
काळभैरवनाथ मंदिर:-
हे मंदिरही पुर्वाचीन असले पाहिजे असे आतमधील कातळकला बघून लक्षात येते.
सद्यकाळात त्यावर रंगरंगोटी करून त्याचे नूतनीकरण (??) करायचा यत्न केला
गेलाय.
गाडी मंदिराच्या बाहेर लाऊन आमचा फापट-पसारा बाहेरच ठेऊन मंदिरात जाऊन
बसलो. रखरखत्या उन्हातून एकदम दगडी मंदिरात गेल्यावर कमालीचा गारवा जाणवला.
मंदिरात महिला पुजारी होत्या. भैरवनाथाला महिला पुजारी कश्या असे एकक्षण
वाटले पण मी त्या गणिताचा उलगडा करायला आलो नव्हतो. नमस्कार करून, गुलाल
उडवून, थोडा आजूबाजूला फेरफटका मारला.
काळभैरवनाथ:
मंदिराच्या बाहेर दोन मोठ्या दगडी दिपमाळा आहेत . त्याने मंदिराचे रूप अजून
खुलून दिसले. शेजारीच एक विहीर आहे. गाडी चिंचेच्या सावलीत दम खात होती
म्हणून थोडा वेळ टीपी केल्यावर मंदिराच्या मागे गेलो.तेथे काही विरगळ
होत्या. त्या बघून थोडे पुढे गेलो तर गावातल्या मुलांचा मस्त गोट्यांचा डाव
जमला होता.
एकाला सांगितले की तू लांबून उडव यातली एक गोटी आणी मी फोटो काढतो. मला
वाटले खूप वेळ जाईल आणि बरेच फोटो काढावे लागतील. पण हा बघा पहिलाच शॉट.
ताडी !!!
एकाच गोटी उडवून स्ट्रायकर गोटी कोणालाही धक्का न लावता बाहेर निघून गेली. वा वा sss
भंकस झाली, गाडीही शांत झाली होती. मग निघालो मल्लिकार्जुन मंदिराकडे.
अडीच च्या सुमारास येथे पोहोचलो. पूर्ण निर्जन असे स्थान माझ्या जोडीला
मंदिरातील देव आणी काही श्वान लोक्स. येथे आल्यावर मात्र "आधी पोटोबा नंतर
विठोबा" म्हणत डबे उघडले.
कडकडून लागलेली भूक डबा उघडताच गोड शिरा पाहून अजून वाढली. आणले होते
नव्हते ते सगळे मांडून खायला सुरवात करताच अजून २ श्वानांची कंपनी लाभली.
मल्लिकार्जुन मंदिर :
ठिकठिकाणी कोरलेल्या कृष्ण-मुद्रा, कृष्ण-लिला, भारवाहक यक्षिणी व इतर अनेक अबोध अशी शिल्पे.
शिवाच्या पायाशी डोक टेकवून आपण बाहेर पडतो तोच समोर दिसते विस्तीर्ण अशी पुष्करणी.
पुष्करणीत पाणी नसल्याने आपोआप समोर लक्ष गेले ते म्हणजे कोरीवकलेच्या उत्कृष्ठ आविष्काराकडे. दगडी नंदी-मंडप.
मंडपाच्या चारही बाजूने उत्कृष्ठ असे कोरीवकाम केलेले आहे. पौराणिक शिल्पे, कामशिल्पे आणी अनेक गज-शिल्पे.
या मंडपात पूर्वी यज्ञवराह विराजमान होता असे तेथे नव्याने उपस्थित
झालेल्या आजोबांनी सांगितले. आजोबा न विचारता मला माहिती पुरवत होते
त्यावरूनच त्यांचा उद्देश्य माझ्या लक्षात आला. थोडी श्रवण-भक्ती करून मग
फोटोभक्ती चालू केली.
येथे एक मांजर होती ती सारखी माझ्या मागे मागे येउन पायात येत होती. तिच्या
पेकाटात लाथ घालून हाकलून द्यावी वाटत होत. पुल म्हणतात तसे मांजर हा
जगातला सर्वश्रेष्ठ उच्छाद आहे.
यज्ञवराह पाहिला आणी वाटले ..... वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!
"त्या काळचे ते मुसलमान म्हणजे" अश्या हरीतात्यांच्या आवेशात जात असतानाच यज्ञ वराहाच्या देखणेपणाने मला इहलोकी आणले.
अडीच फुट उंचीच्या या वराहाच्या शिल्पाचे तोंड फोडलेले आहे पण त्याच्या
पाठीवरील असंख्य विष्णुमूर्ती कोरलेल्या पाहून कारागिराच्या नाजूक हाताची
कल्पना येते. पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल
चढवलेली आहे.
या
वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि
पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले
आहे.
पायाखाली दबलेली गदा आणि दोन पायांमध्ये हात जोडून असलेले मानवी मुख असलेली
शेष-रुपी शिल्प , वाराहाने शेषावर मिळवलेल्या अधिपत्त्याची जाणीव करून
देतो.
वराहाच्या शेपटीत पृथ्वी गुंढाळलेली आहे असे एका लेखात वाचलेले होते.
बरेच फोटोसेशन झाले. नाऊ टाईम टू गो होम !!
मी निघत असलेले बघताच सावलीत झोपलेले आजोबा पुन्हा प्रकटले आणी त्यांनी
"काही" मदत करा म्हणताच माहितीचे प्रयोजन कळले. त्यांना यथाशक्ती मदत करून,
तेथीलच एका मोठ्ठ्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडून घेतल्या भाच्चीसाठी.
आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे
का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात
होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.
सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो
अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत
त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी
विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.
http://sagarshivade07.blogspot.com/2016/01/blog-post_9.html
बारामती : शिलालेखामुळे पणदरेच्या इतिहासाला उजाळा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : पणदरे (ता. बारामती) गाव ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळखले जाते. गावातील अनेक ऐतिहासिक मंदिरे, शिलालेख हे इतिहासाची साक्ष देतात. शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी नुकतेच केले. त्यामुळे गावच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. शिलालेखानिमित्त पणदरे व येथील जगताप घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे.
शिलालेख वाचनासाठी दुधाने यांना बारामती परिसराचा इतिहास उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करणार्या विनोद खटके व मनोज कुंभार या विद्या प्रतिष्ठानच्या दोन शिक्षकांचे सहकार्य मिळाले. याशिवाय राम वाघोले ,अनिकेत राजपूत, राहुल भोईटे यांचीही मदत झाली. पणदरेत मुख्य गावठाणात श्री सोमेश्वर महादेव मंदिराच्या उजव्या बाजूला एक शिलालेख कोरला आहे. तो उठाव स्वरूपाचा असून, सात ओळींचा शुद्ध मराठी भाषेत मजकूर आहे. शिलालेखाची अक्षरे ठळक असून, सुस्पष्टपणे वाचता येतात.
त्यावर रविवार, 13 मार्च 1774 या दिवशी श्री सोमेश्वर महादेव चरणी तत्पर असलेल्या सुपे परगण्यातील मौजे पणदरे येथील गावाचे पाटील महादजीचा त्याचा पुत्र गिरजोजी पाटील त्याचा पुत्र जानराव पाटील जगताप यांचा घुमट बांधला, असा उल्लेख आहे. जानराव पाटील यांचा हा घुमट (समाधी) आहे. पण हा समाधी घुमट नक्की कोणी बांधला याची माहिती शिलालेखात नाही. घुमट बांधल्याची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने तो कोरला आहे.
जगताप घराण्याचा ऐतिहासिक वारसा
सुपे परगण्यात मोकदम पाटील महादजी यांच्याकडे पणदरेची पाटीलकी असल्याचेही
यावरून स्पष्ट होते. हे घराणे शिवपूर्वकालापासून आहे. छत्रपती शिवाजी
महाराज यांनी चिंचवडचे मोरया गोसावी यांना पणदरे गाव इनाम दिल्याचे 1649 चे
पत्र उपलब्ध आहे. पुरंदरच्या लढाईत किल्ल्याच्या पायथ्याशी जी लढाई झाली
त्यात मुसेखान गोदाजी जगताप यांच्याकडून ठार झाला, तर फत्तेखान बेलसरकडे
पळून गेला. त्या लढाईत नंदाजी जगताप शिवरायांकडून लढले असा उल्लेख आहे.
सुप्याच्या पाटीलकीच्या वादाबद्दल शिवाजी महाराजांनी जगतापांची कानउघडणी केली ते 6 मार्च 1676 पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजेश्री रामोजी जगताप व खंडोजी जगताप यांचे नाव आलेले आहे. येथील कोकरे (धनगर) व जगताप (मराठा) यांच्याकडे छत्रपती शाहू व पेशवाईत निमपाटीलकी राहिली. शहाजीराजे यांच्या जहांगिरीतील सासवडमधील 10 गावांची देशमुखी जगतापांकडे होती. त्यात बारामती परिसरातील होळ, मुरूम, वाकी, वाणेवाडी, पणदरे आदींचा उल्लेख आहे.
https://pudhari.news/maharashtra/pune/456494/illuminate-the-history-of-panadare-with-inscriptions/ar
आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे,
समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना
लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो
मल्हारगडचा बेस
इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.
बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता)
एवढा पाऊस पडून, संपूर्ण प्रदेश हिरवागार होऊनही याच्या नशिबात नव पालवी नसावी. वार्धक्याच्या खुणा सोसतच काही आयुष्ये सुखाला समांतर जातात.
येथून सरळ गेले की माळशिरस गाव आणी डावीकडे बोपदेव घाट.
पाऊस थांबला तसे आम्ही मंदिरात पोहोचलो. गणपतीचे दिवस असल्याने गर्दी जास्त नव्हती. मंदिराच्या कळसाची डागडुजी चालू असून शिल्पांना चुनकळीच्या रंगाने लेप देण्याच्या प्रकार सुरु आहे असे समजले. जो माणूस हे सांगत होता त्याच्या मित्राने सगळे ऐकून एकाच प्रश्न विचारला. "जमणार आहे का पण आपल्या लोकांना हे?"
तेही खरच आहे म्हणा,कारण इतके बारीक आणी तपशिलात हे कोरीवकाम केलेले आहे की त्याचे कोटिंग करणे पण सोपे काम नाहीये. असो.
इतकी वर्षे स्वतःचे अस्तित्व जपून उभे असलेले हे मंदिर म्हणजे दौलत मंगळ किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.
बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले. निव्वळ शब्दातीत.
मंदिरात प्रवेश केला आणी एकदम यादवकाळात गेलो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळत होते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.
![]() |
| बिनी दरवाजा - किल्ले पुरंदर |
![]() |
| मुख्य दरवाजा येथील वळणदार दगडी पायऱ्यांची वाट - किल्ले पुरंदर |
![]() |
| मुख्य दरवाजा येथील हनुमान मुर्ती - किल्ले पुरंदर |
![]() |
| दरवाजा - किल्ले पुरंदर |
![]() |
| कंदकडा व मागे वज्रगड - किल्ले पुरंदर |
![]() |
| वाड्याचे अवशेष - किल्ले पुरंदर |
![]() |
| पाण्याचे टाके - किल्ले पुरंदर |
![]() |
| केदारेश्वर मंदिरा जवळील पायऱ्या - किल्ले पुरंदर |
![]() |
| केदारेश्वर मंदिरा जवळील पायऱ्या - किल्ले पुरंदर |
![]() |
| केदारेश्वर मंदिर - किल्ले पुरंदर |
Purandar fort in Monsoon
Trekkers for Purandar were me and my wife Renuka
![]() |
| Bini Darwaja |
About Purandar fort:
Purandar fort stands 4,472 ft. above the sea (1,387 m) in the Western Ghats, 52 kilometres southeast of Pune.The fort was a good place for defence. It had the capacity to house many soldier-troops, foods grains and ammunition which proved sufficient for long durations during wartime. Nonetheless, the fort hosts strongly fortified places from which a watchful eye can be kept over surrounding areas.History says that Purandar was from Yadava’s era. The 1000 yr. old Narayaneshwar temple of Hemadpanthi architecture built by the Yadava’s still exists in Narayanpur, the base village of Purandar.
This fort witness many more historical events like famous Treaty of Purandar in the year 1665, Shivaji Maharaja’s eldest son and successor was born at Purandar fort.I will share some history of Purandar fort on the blog.
To reach on Purandar, there are two routes. One is from Hadapsar – Saswad route and another one is from National highway 4. I went via the second route which is Pune – Waraje – National Highway 4 (Towards Kolhapur side) – Cross first toll plaza – Cross Nasarapur (do not take any turn at Nasarapur) – After driving for few km, Take left at Kapurhol (on NH4) – Narayanpur village – Cross Narayanpur village and after 1 km take right turn for fort which is opposite to Petrol pump.
By personal vehicle, you can go to fort directly (to avoid 1 hr. trek) and then you can explore the fortification. As we were on our trek, we decided to do a trek from the base.
21st July 2013: Trek to Purandar fort (Total Distance travelled: 105 km):
We woke up early morning by 7.30 am and left Pune by 8 am. When we reached on National highway, rain god welcomed us with a heavy shower. Due to bike journey, we reached at the base village after 1.5 hours of wonderful rainy drive. We reached the base village, and the entire fort was covered with cloud. Many villagers told us to go up on the bike and why to waste your time to climb the fort. Few of them warned us that route will be muddy and slippery so take proper care while climbing.
![]() |
| Starting point of Trek route |
After our short discussion, we came up with the option to trek rather than drive. Also, safety is the most important part of trek so we decided that if anyone from us feels the trek route is not safe, we will turn back. It was raining so I was not able to capture any photos. In fact most of the time on the trek, my camera was in the bag due to heavy rain. Initial part was ok but after few min, we started facing problem to climb. Not because of difficulty level but due to mud and slippery path. The rain was causing a continuous cascade of water on the trail; it was pretty slippery at times, but it was fun. Every time we were searching for an alternate route to avoid slippery route. Renuka did a great job even though she is not experiencing trekker. Once halfway through, the muddy route turned into deep forest climbing route. It was a thick maze of bushes, which was pretty cool. I think we were the only 2 trekkers for the entire path. At the end of the trek, our track pants were a slushy mess.
![]() |
| Forest Path |
After few min, we reached the wall. We took a left turn here for the fort. Fort direction is marked on the wall with paint. From this point, it’s a steady climb till the top. There is also a small waterfall on this route where you can get wet if you feel that rainwater is not enough to wet you in the monsoon. After climbing on last rocky steps stretch, we reached Bini Darwaja. We reached this point in just 50 min. The door is in good condition even today. As one enters through the door, there are provisions for the guards to hide and attack the enemy. These are called as the Gatehouses. Once you enter through the door, the road branches, and one straight ahead whereas the other towards the rear ends of the fort.
![]() |
| Way to Bini Darwaja |
![]() |
| Walk towards Bini Darwaja |
We moved ahead to the fort after taking a small halt. We saw an abandoned church walking on the road. This church was built by British after the fort was captured by them in 1818. You can see some other structures and houses which are belong to the Indian military. This fort is a training center of Indian Military. After a km walk on road, you will find signboards for the fort area. There is small check post set up by military. It is mandatory to enrol your name and other details. Sometimes they ask for Identity card just to cross check your details.
![]() |
| Church |
From this point, our second half of trek begins. It was a simple route to climb. We were constantly in the cloud and in heavy rain. It was too difficult to take any photograph. Due to the clouds, we were not able to see surrounding view but weather was very pleasant. On this route, we saw few bastions, old-time water tanks and some fortification. This route goes to Kedareshwar temple which was our final destination. It took us around 1 hour to reach at the temple.
| Steps for Kedareswar temple |
![]() |
| Kedareshwar |
Before I write further, I would like to share some history about Purandar fort. In 1596, when Bahudar Shah of Ahmednagar sultanate granted Maloji Bhosale (grandfather of Shivaji) Poona (Now Pune) and Supa, the fort of Purandar was included as well. In 1646, a 19-year-old Shivaji in one of the first victories of his legendary career established control in the fort.
In 1665, it was besieged by the forces of Aurangzeb, under the command of Mirja Raja Jai Singh, a Rajput general, assisted by Diler Khan, an Afghan. The defence of Purandar by Murarbaji Deshpande of Mhar, the killedar (keeper of the fort) was obstinate and he lost his life in the struggle to retain the fort. Diler Khan, impressed with the bravery of Murarbaji, offered him a truce and employment in the Mughal forces with a handsome salary. Murarbaji turned down the offer due to his loyalty to the ideals of Hindavi Swarajya. He was extremely enraged at this very suggestion and in an act of extreme daredevilry charged with his commando’s right into the heart of the Mughal troops, killing hundreds. Diler Khan was so much impressed with Murarbaji that after his death he said, such this warrior was blessed by God Alha ("असा शिपाई खुदाने पैदा केला.").
![]() |
| Murarbaji Deshpande (Photo taken from Wikipedia) |
Things to carry for Purandar trek:
- A water bottle to carry at least 2 litres of water
- Some dry food, in case you didn’t find any suitable food stall
- Windcheater/jacket / Barsati during monsoon trek.
- Do carry instant energizers like Glucon-D or Tang.
- A towel or napkin and 2-3 old newspapers
- Camera to capture best nature movement
- Better avoid wearing Gold and other ornaments. No need to carry heavy cash.
- Bike petrol: INR 150/- (approx. 2 lit at INR 74.5/lit)
- No Expenses on food as we were caring food from home.
Thanks for reading this Travel Blog. Happy travelling.
![]() |
| पानसे वाडा प्रवेशद्वार |
![]() |
| लक्ष्मीनारायण मंदिर |
![]() |
सूर्यदेव |
![]() |
पानसे वाडा |
![]() |
बारव |
![]() |
गणराय |
![]() |
पानसे वाडा |
![]() |
बुरुज व त्याला लागून असलेली तटबंदी |
| चोर दरवाजा - किल्ले मल्हारगड |
| विहीर - किल्ले मल्हारगड |
| बांधीव तलाव - किल्ले मल्हारगड |
| राजवाडा अवशेष - किल्ले मल्हारगड |
| खंडोबा व महादेव मंदिर - किल्ले मल्हारगड |
| बाले किल्याचा महादरवाजा - किल्ले मल्हारगड |
| मुख्य दरवाजाचा आलीत बाजू - किल्ले मल्हारगड |
| मुख्य दरवाजा - किल्ले मल्हारगड |
| मुख्य दरवाजाचा आलीत बाजू - किल्ले मल्हारगड |
![]() |
| दिवे घाटातील विठ्ठलाची मूर्ती - सासवड |
दौंड येथील विठ्ठल मंदिर
आम्ही मित्र भिगवणला पक्षी निरीक्षणासाठी आलो असताना प्रवासासाठी
श्री. वैद्य यांची गाडी केली. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर भुलेश्वर मंदिर
बघायचे ठरले. मंदिर बघून झाल्यावर आमची आवड व उत्साह पाहून वैद्य यांनी
दौंड येथील विठ्ठल मंदिर नक्की बघा असा आग्रह केला. रात्री आठ वाजता
घाईघाईत मंदिर पाहिले. दौंड शहरात मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे.
सुरूवातीला नवीन सभामंडप बांधला आहे . आतील काम संपूर्ण दगडी आहे. साधारण
हे मंदिर ३०० वर्ष जुनं असावं. परंतु आतली दोन्ही सभामंडप खूपच भव्य आहेत.
आतील दगड अत्यंत अशलर मेसनरी बांधकामासारखे घडवलेले आहेत. आणि मध्यभागी
महिरप आणि कमळाच्या फुलांच्या डिझाईनचा सुरेख मेळ घातलेला आहे. मंदिर
प्रत्यक्ष पाहिल्यावर याची भव्यता कळते.
दौंडला रेल्वेने आल्यास श्री
मनोज वैद्य भिगवण,कुंभारगाव, कुरकुंभची फिरंगाईदेवी, दौंड चे विठ्ठल
मंदिर, भुलेश्वर मंदिर , लोणी भापकरचे वराह मंदिर दाखवून आणू शकतात.
त्यांचा मोबाईल क्रमांक- +91 94223 37598
जेजुरी परिसर
जेजुरी परिसरातील विविध मंदिरे, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे यांचे माहिती सह सचित्र दर्शन
साकुर्डे पांडेश्वर भुलेश्वर नाझरे वाल्हे मोरगाव सासवड पुरंदर वज्रगड सोनोरी शिवरी नारायणपूर केतकावळे वीर कानिफनाथ हरेश्वर चतुर्मुख पिंगोरी कोळविहिरे हरणी सोमेश्वर गुळुंचे टेकवडी आंबळे जवळार्जुन

शंकरेश्वर / रामेश्वर / बोंबलेश्वर ( साकुर्डे )

जेजुरीच्या पश्चिमेस ७ किमी अंतरावर असणाऱ्या साकुर्डे गावाचे दक्षिणेस
असणाऱ्या डोंगर रांगा मधील दरीच्या परिसरास देवदरा या नावाने ओळखले जाते
याच ठिकाणी ही मंदिरे आहेंत येथे गाडी रस्त्याने पोहचता येते. दरीच्या
सुरवातीच्या टेकडीवर गणपती व बहिरव नाथाची छोटी मंदिरे आहेंत.पुढील दरीत
शंकरेश्वराचे दक्षिणाभिमुख मंदिर आहे या मंदिराचे मंडपाचे अवशेष दिसतात
मंडपात नंदी असून गर्भगृह खोल आहे गर्भगृहात शंकरेश्वराचे लिंग आहे. मणि
मल्लदेत्याचे छळास कंटाळून आलेल्या ऋषींनी याच ठिकाणी आश्रय घेतला होता व
शंकरांनी कडेपठारी मार्तंड अवतार धारण केलेवर ऋषींचे विनंती वरून ते येथे
आले होते अशी जनश्रुती आहे. या मंदिराचे पूर्वेस एक जलकुंड आहे यास तापशमन
तीर्थ म्हणतात. ऋषींनी जेथे शंकरांचे पाय धुतले त्या ठिकाणी ते निर्माण
झाल्याचे सांगतात. येथेच शेजारी बोंबलेश्वराचे शिवलिंग आहे. या ठिकाणी
गणपतीने शंखनाद केल्याने यास बोंबलेश्वर असे म्हणतात. या लिंगाचे दर्शनाने
पृथ्वी प्रदक्षणेचे पुण्य मिळते असे मानले जाते. येथील दक्षिणे कडील दरीत
रामेश्वराची छोटीशी घुमटी व एक शिवलिंगाकृती विहीर आहे. प्रभू रामचंद्र
वनवासात असताना त्यांनी येथे वास्तव्य केले होते असे मानतात. आद्य
क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे वास्तव्य या ठिकाणी होते.
पांडेश्वर

जेजुरी पासून ८ किमी अंतरावरील पांडेश्वर या गावी कऱ्हा नदी काठी हे मंदिर
आहे, जनश्रुती नुसार हे मंदिर पांडवानी बांधले म्हणून ते पांडवेश्वर काळाचे
ओघात ते पांडेश्वर झाले . या मंदिराचे नावावरून हे गाव पांडेश्वर झाले
कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. या मंदिराची रचना
मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह, अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून
कलाकुसरीने युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य
मंदिर हे मोठ्या विटा व चुण्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे
असून ते तिसऱ्या चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गिलाव्याचे
काम ईस ११९६ मध्ये झालेचे येथील मंदिरातील गिलाव्यावरील लेखातून समजते.
गर्भगृहात एका भव्य आसनावर एक भव्य शिवलिंग आहे. वनवासात असताना पांडवानी
हे लिंग स्थापून यज्ञ केल्याची जनश्रुती आहे. याच यज्ञासाठी गंगाजल
आणण्यासाठी चतुर्मुखावर ध्यानस्त असलेल्या ब्रम्हादेवांचा कमंडलू पांडवानी
लवंडला व त्या पासून कऱ्हा नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते. मंदिरावरील
कळसाचे व परिसरातील ओवरीचे काम १८ व्या शतकातील वाटते मंदिराचे दक्षिणेस
एक गणपतीची घुमटी आहे त्या मध्ये गणपती मूर्ती शेजारी गणेशपाद आहेंत या
मुळे या क्षेत्रास गणेशगया ही म्हटले जाते, येथेच पांडवानी पितृश्राद्ध
केल्याचे ही सांगतात मुख मंदिरा मागील ओवरीत शक्तीची प्रतिमा म्हणजेच
पार्वतीची ही प्रतिमा आहे. मंदिराच्या विविध स्थापत्यशैलीचा मिलाफ असलेले
हे मंदिर आवर्जून पाहावे असेच
भुलेश्वर

जेजुरी पासून १८ किमी अंतरावरील माळशिरस गावा पासून जवळच असणारे हे मंदिर
सह्याद्रीच्या डोंगररांगा मधील भेलन डोंगर म्हणून ओळखल्या जात असलेल्या
डोंगरावर आहे. इतिहासा मध्ये ” किल्ले दौलत मंगल ” अशी याची ओळख आहे ईस
१६३४ मध्ये मुरार जोगदेव यांनी येथे किल्ल्याचे काम केल्याचे संदर्भ
सापडतात येथे गाडी रस्त्याने थेट मंदिरापर्यंत जाता येते, एका भव्य
चौथर्यावर भव्य भुलेश्वराचे मंदिर आहे,मंदिरापुढील मंडप व नगारखाना ईस १७४०
मध्ये पेशव्यांनी बांधला आहे. मंदिराची तटबंदीची बाह्य बाजू अठराव्या
शतकातील वाटते. मंडपातून जिन्याने वर चढून गेले की मुख्य मंदिराचा आवार
लागतो येथील शिल्पकलेचे सौन्दर्य मंत्र मुग्ध करणारे आहे. जनश्रुती हे
मंदिर पांडवानी एका रात्री मध्ये बांधल्याचे सांगते पण या मंदिराचे काम ईस
१२५० चे दरम्यान चोलवंशीय राजांनी केल्याचे जाणकार सांगतात, नंदी मंडप,
चौरस मंडप, अंतराळ, नक्षत्राकृती गर्भगृह अशी या पूर्वाभिमुख मंदिराची रचना
आहे, नंदीमंडपाचे स्तंभ व वरील भाग कलाकुसरीने युक्त असून यक्ष, प्राणी,
देवताचे मूर्ती येथे दिसतात चौरस मंडपास तीनही बाजूने प्रवेशद्वार असून
यांचेवर सुबक नक्षीकाम केलेले आहे प्रवेशद्वाराचे बाजूस युद्धशिल्प ,
गजशिल्प आहेंत. मंडपाचे आतील बाजुस छतावर यक्षमूर्ती, कीर्तिमुख,समुद्र
मंथन, कोरलेले आहे. पुढे अंतराळ लागतो गर्भगृहाचे प्रवेशद्वार कलाकुसरीने
युक्त आहे गर्भगृहात शिवलिंग आहे शिवलिंगामध्ये खोलात स्वयंभू रूपातील लिंग
आहेत, मंदिराचे सभोवतालीच्या मंडपात अनेक देवकोष्ट आहेंत मुख्य मंदिराचे
बाह्यअंगावर अनेक सोष्टव पूर्ण शिल्प दिसतात ही आज खंडित अवस्थेत आहेत
तरीही त्यातील सौन्दर्य अप्रतिम आहे नर्तिका, दर्पणधारिणी, देवता अशी अनेक
शिल्प यात आहेत. मंदिरावरील नक्षीकाम अवर्णनीय आहे. बाह्यमंडपाचे वरील
बाजुस मातृका शिल्पपट आहेंत यात एंद्री,वाराही,महेश्वरी.विनायकी, वेष्णवी,
अश्या अनेक मातृका दिसतात.मंदिर परिसरात सातवाहनकालीन पाण्याची टाकी आहेत,
येथील अनाम शिल्पकारांची कला पाहण्यासाठी एकदा तरी आवर्जून येथे भेट दिली
पाहिजेच.
नागेश्वर ( नाझरे )

जेजुरी पासून ९ किमी अंतरावर असलेल्या नाझरे गावी कऱ्हा नदी काठी हे
पूर्वाभिमुख मंदिर नदीच्या पुर्व तटावर आहे. अलीकडे या मंदिराचे
जिर्नोधारातून त्याला आधुनिक रूप मिळाले आहे, या ठिकाणी नाग तप करत होता व
त्याने स्थापन केलेले शिवलींगम्हणून ते नागेश्वर मंदिराचे मागील बाजूस
कऱ्हा नदी मध्ये सुंदर धबधबा आहे. नदीवरील मल्हार सागर धरण भरून वाहू
लागल्यावर हा धबधबा पडू लागतो या धबधब्यामुळे नदीत तयार झालेल्या डोहास
नागतीर्थ असे म्हणतात
महर्षी वाल्मिकी समाधी ( वाल्हे )

जेजुरी पासून १२ किमी अंतरावर वाल्हे या गावी हे समाधी मंदिर एका ओढ्या
काठी आहे. पुरातनकाळी वाल्ह्या कोळी या ठिकाणी राहून वाटमारी करीत असे
त्याचे नावा वरून या भागास वाल्हे असे नाव पडले. गावाचे उतरेस एका उंच
डोंगरावर सात उंच खडक दिसतात हे वाल्ह्या कोळी याचे सात रांजण असल्याची
जनश्रुती आहे. या वाल्ह्या कोळयास वाटमारी करताना नारदांचा अनुग्रह झाला व
त्याचा वाल्मिकी झाला याच वाल्मिकीने पुढे रामायण हे महाकाव्य लिहिले व ते
महर्षी वाल्मिकी ऋषी झाले अश्या या महर्षी वाल्मिकीचे हे समाधी स्थळ. येथे
भाद्रपद शुद्ध पंचमीस म्हणजे ऋषी पंचमीला मोठी यात्रा भरते
मयूरेश्वर ( मोरगाव )

जेजुरी पासून मोरगाव १७ किमी अंतरावर आहे. अष्टविनायकातील प्रथम गणपती
म्हणजे मोरगावचा मयूरेश्वर होय. ब्रम्हा, विष्णू , महेश, सूर्य व शक्ती या
पंचदेवांनी या गणरायाची स्थापना केले असे मानले जाते. त्रेतायुगात पृथ्वीवर
सिंदुरासूर राक्षसाने सर्व देवांना बंदिवासात टाकले होते. तेव्हा
पार्वतीने मातीचा गणपती करून त्याची आराधना सुरु केली व भाद्रपद शुद्ध
चतुर्थीला गणपतीने जन्म घेतला त्या नंतर गणपतीने मोरावर स्वार होऊन
सिंदुरासूर राक्षसाचा वध केला त्याचे मयूर वाहनामुळे त्याला मयूरेश्वर हे
नाव मिळाले. येथील मयूरेश्वर मंदिराची उभारणी सोळाव्या शतकात झाली असल्याचे
सांगितले जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते
पंचमी हे दहा दिवस मोरगाव येथे यात्रा असते, या दिवसात भाविकांना गर्भगृहात
प्रवेश मिळतो.
सासवड
सासवड जेजुरी पासुन १७ किमी अंतरावर असुन पुरंदर तालुकाचे मुख्यालय आहे, या शहराला सांस्कृतिक, ऐतिहासिक , धार्मिक वारसा लाभलेला आहे. संत नामदेवांनी सोपानदेव समाधी वर लिहिलेल्या अभंगात या गावाचा उल्लेख सवंत्सर असा केलेला आहे. जुन्याकाळी या ठिकाणी सहा वाड्या होत्या वरखेडवाडी, सरडी, सदतेहे, सवंत्सर, दाणे पिपळगाव, सनवडी या वाड्याचे स्वरूप एकत्र होऊन या पासुन सासवड हे गाव अस्तित्वात आले असे मानले जाते, ही नगरी कर्हा व चरणावती या दोन नद्यांचे संगमावर उत्तर बाजुस वसली आहे. या गावास शिवकाळात संपूर्ण कोट होता, मोगली आक्रमणांच्या काळात त्याची नासधूस झाली, छत्रपती शाहूमहाराज यांचे काळात या कोटाचा उपयोग दमाजी थोरात यांनी पुरंदर किल्ल्यास शह देण्यासाठी केला, या बंडाचा बीमोड झाल्यानंतर या कोटाचा उपयोग पुरंदर किल्ल्यास शह देण्यास पुन्हा होऊ नये या साठी हा कोट मुद्यामच जमीनदोस्त करुन नामशेष करुन टाकला गेला . पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचाही वाडा या ठिकाणी होता, काळाचे ओघात तो नष्ट झाला. सासवड मध्ये श्री संगमेश्वर , वटेश्वर , सिध्देश्वर, कर्हामाई ही मंदिरे सरदार पुरंदरे, कुंजीर यांचे वाडे संत सोपानदेव महाराज, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ , सरसेनापती वीर बाजी पासलकर, गोदाजीराजे जगताप यांची समाधी स्थाने आहेत हे साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांचे जन्मगांव महात्मा गांधीचे शिष्य शंकरराव देव, प्रेमलता कंटक यांनी स्थापना केलेला कस्तुरबा आश्रम अशी अनेक प्रेक्षणीय, ऐतिहासिक,धार्मिक ठिकाणे येथे आहेत.
संत सोपान देव संजीवन समाधी मंदिर

येथील चरणावती नदी काठी हे मंदिर आहे, मंदिरास पुर्वाभिमुख भव्य कोट असुन
पायऱ्या चढून कोटात प्रवेश करता येतो, समोरच पूर्वाभिमुख पुरातन शिव मंदिर
असुन

या मंदिराचे मागील बाजुस संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर आहे, पूर्वाभिमुख मंदिराची रचना वीणामंडप, मंडप व गर्भ गृह अशी आहे,

वीणामंडप लाकडी असुन या वर पत्र्याचे छत आहे, मंडपाचे लाकडी खांब नक्षीने युक्त आहेत, या मंडपात हनुमानाची प्रतिमा आहे, येथे अखंड वीणा वादन केले जाते, या मंडपातून मंदिराची मुख्य दगडी मंडपात जाता येते.

या मंडपात गर्भगृहाचे दरवाज्याचे दोन्ही बाजुस देवड्या असुन दक्षिणे कडील देवडीत राम लक्ष्मन सीता यांचे मुर्ती असुन उत्तरे कडील देवडीत विठ्ठल रुक्मिणी यांच्या मुर्ती आहेत,

मंदिराचे गर्भ गृहात संत सोपानदेवांची संजीवन समाधी असुन समाधी मागील कोनाड्यात कृष्ण मुर्ती आहे.

संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरांचे बंधू यांचा जन्म कार्तिक शुद्ध
पौर्णिमा शके ११९९ (ईस १२७७) मध्ये झाला भगवदगीतेवर त्यांनी साररूप ओवीबद्ध
टीका ” सोपानदेवी ” या नावाने लिहिली. वयाचे १९ वे वर्षी त्यांनी
मार्गशीर्ष वद्य तृतीया शके १२१८ ( ईस १२९६) साली त्यांनी या ठिकाणी जिवंत
समाधी घेतली,

समाधी मंदिराचे मागील बाजुस दत्त मंदिर आहे.

समाधी मंदिराचे उत्तर बाजुस एका चिंचेच्या वृक्षा खाली एक दगडी चोथारा असुन
या ठिकाणा हून संत सोपान देवांनी आपल्या समाधीत समाधिस्त होण्यासाठी
प्रवेश केला

या मंदिरात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत येथे यात्रा भरते,

आषाढी वारी साठी संत सोपानदेवांचा पालखी सोहळा येथून प्रस्थान करतो
संगमेश्वर मंदिर

कऱ्हा व चरणावती या दोन नद्यांचे संगमावर संगमाचे पश्चिम तटावर बांधलेले हे
पूर्वाभिमुख शिवमंदिर नदी संगमावर असलेला हा संगमेश्वर, नदी संगमावर
बांधलेल्या भव्य दगडी घटावर हे देखणे मंदिर आहे मंदिराचे उत्तर पुर्व बाजुस
असलेल्या लोखंडी पुला वरून मंदिराचे घाटावर जाता येते. हे पेशवेकालीन
मंदिर त्याकाळच्या मंदिर निर्माण कलेचे एक आदर्श उदहरण आहे, घाटावरील विशाल
दगडी पायरी मार्गाने या मंदिराचे आवारात पोहचता येते मुखमंडप, मंडप,
गर्भगृह अशी पुर्वभिमुख दगडी मंदिराची रचना असुन मुखमंडप ३० दगडी खांबांवर
आधारलेला आहे, याच मंडपात एक सुंदर दगडी नंदी प्रतिमा आहे.

मंदिराचा मंडप सुबक दगडी बांधणीचा आहे, मंडपात डाव्या बाजुस गणपती व दक्षिण
बाजूस मारुतीची मूर्ती आहे मंडपास उत्तर व दक्षिण बाजुने प्रवेशद्वार
आहेत, मंडपाचे मध्यभागी कासव कोरलेले आहे. येथील खांबावर जय विजय यांचे
प्रतिमा आहेत. मंडपातील गर्भगृहाचा दरवाजा कलाकुसरीने नटलेला आहे.

गर्भगृहाचे प्रवेशदारातून गर्भ गृहात गेल्यावर समोरच संगमेश्वरचे शिवलिंगा चे दर्शन होते.

मंदिराचे बाह्य अंग दगडावरील नक्षीकामाने नटलेले आहे. मंदिराचे दक्षिण
बाजुच्या घाटावर खडकेश्वर मंदीर व आणखी काही छोटी मंदिरे आहेत. मंदिराचे
मागील दक्षिण व उत्तर बाजुस दोन शिव मंदिरे आहेत. दक्षिण बाजुस वृंदावन व
काही बांधकाम आहे.
या मंदिरा समोरील पुलावरून या मंदिराचे विलोभनीय दर्शन होते. त्रिपुरी पौर्णिमा व दीपावलीत येथे रात्री दिपोस्तव साजरा होतो.
कर्हामाई मंदिर
संगमेश्वर मंदिराचे पुर्व बाजुस कऱ्हा नदीचे उत्तर बाजुस हे मंदिर आहे
पुरंदरची जीवन रेखा असलेल्या कर्हा नदीचे हे प्रतीकात्मक मंदिर मंदिराचे
आवाराचे बांधकाम एका वाड्या प्रमाणे देऊळ वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार
उत्तरेस असुन , या दरवाज्यातून आत गेल्यावर प्रशस्त आवार लागते यात पश्चिम
बाजुस लाकडी मंडप असुन मंडपात पश्चिम बाजुस एका चोथर्यावर रका देवडीत
कर्हामाईची मुर्ती आहे, वनवासात असताना पांडवानी पांडेश्वर येथे शिवलिंग
स्थापून यज्ञ केल्याची जनश्रुती आहे. याच यज्ञासाठी गंगाजल आणण्यासाठी
चतुर्मुखावर ध्यानस्त असलेल्या ब्रम्हादेवांचा कमंडलू पांडवानी लवंडला व
त्या पासून कऱ्हा नदीची व चरणावती नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते.
चरणावती नदी येथील संगमावर कऱ्हा नदीस मिळते व येथून पुढे वाहते
पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ समाधी

कर्हामाई मंदिराचे दक्षिण बाजुस कर्हा तीरावर ही समाधी असुन समाधी
परिसरात छोटासा बगीचा आहे. बाळाजी विश्वनाथ भट हे मुळचे कोकणातील त्यांचा
जन्म अंदाजे ईस १६६० मधील , १६८९ पासुन ते स्वराजाचे सेवेत होते, छत्रपती
राजाराम जिंजीवरून परत आल्यावर बाळाजी पुण्याचे सर सुभेदार झाले, त्यावेळे
पासुन त्यांचे वास्तव्य सासवडला होते, सासवड येथे त्यांनी वाडा बांधला होता
राजारामाचे मृत्यु नंतर राणी ताराबाई व धनाजी जाधव यांचे नेतृत्वा खाली ते
कार्यरत होते. औरंगजेबाचे मृत्यू नंतर शाहू महाराज मोघलांचे कैदेतून मुक्त
झाले. धनाजी जाधव शाहुना मिळाले त्यांचे बरोबर बाळाजी शाहुना मिळाले.
बाळाजीनी अनेक मराठा सरदाराना शाहून कडे वळवून त्यांची शक्ती वाढवली. व ते
शाहूंचे विश्वासू झाले. कर्तबगार बाळाजी वर विश्वास टाकून शाहूराजांनी
त्यांना १७ नोव्हे १७१३ रोजी ” पेशवे” ( पंतप्रधान ) पद दिले. बंडखोरी
मोडून शाहूंचा अंमल प्रस्थापित करणे, कान्होजी आंग्रे ना शाहू गोटात आणणे,
शाहूंच्या परिवाराची मोगलान कडून सुटका, स्वराजाच्या सनदा आणणे अशी अनेक
कामे त्यांनी केली मराठा सरदारांची एकी करून त्यांनी सत्ता विस्ताराचा पाया
रोवला. २ एप्रिल १७२० मध्ये सासवड येथे त्यांचे निधन झाले.
गोदाजीराजे जगताप समाधी

संगमेश्वर मंदिराचे उत्तर बाजुस असणाऱ्या रस्त्याचे पश्चिम बाजुस
पूर्वभिमुख छोटीशी घुमटी आहे , ही गोदाजीराजे जगताप यांची समाधी, गोदाजी
जगताप हे छत्रपती शिवाजीचे बालमित्र स्वराज उभारणीत त्यांनी शिवरायांना
मोलाची साथ दिली, तोरण्याचा विजय व स्वराज्याचे पुरंदर किल्ल्या वरून
लढलेले स्वराजाचे पहिले समर यात त्यांचे योगदान होते गोदाजीचा संपूर्ण
इतिहास आजही प्रकाशात आलेला नाही. ईस १६४९ मध्ये स्वराज्याची पहिली लढाई
पुरंदर वरून लढली गेली, विजापूरचे सैन्य शिवाजी महाराजांचा बंदोबस्त
करण्यासाठी पुरंदर कडे निघाले , या सैन्याने खळद बेलसर जवळ छावणी टाकली
होती फतेखानाने पुरंदर साठी नेट लावला होता, बाळाजी हैबत याने शिरवळचा कोट
जिंकून पुरंदरला शह दिला होता. शिवाजी महाराजांनी कावजी मल्हार यास शिरवळ
चे कामगिरीवर पाठवले यात गोद्जी सोबत होते व ही मोहीम फत्ते झाली. पुरंदर
वरील सैन्याने बेलसर मधील छावणीवर अचानक छापा मारला. त्यामुळे मुसेखानाचे
सैन्य पुरंदरवर चालून आले. येथील लढाईत मुसेखान व गोदाजी जगताप यांची गाठ
पडली, तुबळ लढाईत गोदाजीने मुसेखानाला उभे चिरले हे पाहून विजापूर सैन्य
पळून गेले. या गोदाजीचे पराक्रमाचा उल्लेख इतिहासात आढळतो गोदाजीचा मृत्यु
केव्हा झाला हे आज तरी माहित नाही, या पराक्रमी वीराची ही समाधी
वीर बाजी पासलकर समाधी

सासवड शहरातील नेहरू चौकात ही समाधी आहे. बाजी हे मावळातील वजनदार योद्धे
त्यांनी मावळातून स्वराज स्थापणे साठी मोठी रसद उभी केली, ईस १६४९ मध्ये
फतेखानाचे छावणीवर खळद बेलसर परिसरात अचानक हल्ला केला. या वेळी च्या लढाईत
बाजींना वीरमरण आले स्वराजाच्या यज्ञकुंडात आत्मआहुती देणारे बाजी पासलकर
हे जेष्ट नामाकीत होत.
चांगा वटेश्वर मंदिर

संगमेश्वर मंदिराचे दक्षिण दिशेस सासवड – नारायणपूर रस्त्याचे थोडेसे
बाजुला कऱ्हा काठावर असणारे हे सुंदर दगडी मंदिर, जुन्याकाळी हे मंदिर
नीलकंठ या नावाने ओळखले जात होते, या परिसरात मोठे पुरातन अनेक वटवृक्ष
आहेत या कारणाने या मंदिरास वटेश्वर हे नाव पुढे मिळाले असावे , जुन्याकाळी
हा परिसर सिद्धसाधकांची तपोभूमी होता १४०० वर्ष जगले अशी जनश्रुती असलेले
सिद्धयोगी चांगदेव यांनी येथे वास केल्याचे मानले जाते, चांगदेव लहान
असताना त्यांचे आई-वडील लहानपणी निवर्तल्याने त्यांचे बालपण वटेश्वराचे
सानिध्यात गेले, त्यांनी येथे तपाचरण केली या मुळे हे मंदिर चांगा वटेश्वर
मंदिर या नावाने ही प्रसिद्ध आहे.
कऱ्हा नदी वरील छोटा पूल पार करून पायऱ्या चढून मंदिरचे कोटाचे प्रवेशद्वारात पोहचता येते, मंदिराचा कोट दगडी बांधकामाचा आहे ,

मंदिराचे प्राकारात वटेश्वराचे पूर्वाभिमुख दगडी मंदिर आहे मंदिराची रचना
मुखमंडप, मंडप, गर्भगृह, अशी आहे मुख मंडपात प्रवेश करण्यासाठी पूर्वा,
उत्तर, दक्षिण बाजुंनी पायऱ्या आहेत, मंडपाचे दगडी खांबानवर विविध पुष्प,
प्राणी, नर्तिका, युगल यांची शिल्प कोरलेली आहेत. या मंडपा मध्ये सुंदर
कलाकुसरीने नटलेली मोठी नंदी प्रतिमा आहे या मंडपातील पश्चिम द्वारातून
मंदिराचे मंडपात जाता येते

मंदिराचा मंडप सहा खांबावर आधारलेला असुन या खांबावर सुबक नक्षीकाम केलेले
आहे या मंडपास ही उत्तर व दक्षिण बाजुने प्रवेशद्वार आहेत. या मंडपाचे पुढे
पश्चिमेस अंतराळ असुन पुढे गर्भगृह लागते, गर्भागृहाचे दरवाजा कोरीव
कामाने नटलेला आहे

गर्भ गृहाचे दरवाज्यातून आत गेल्यावर समोर वटेश्वराचे शिवलिंग आहे ,
शिवलिंग मागे पश्चिम बाजुस एका कोनाड्यात संगमरवरी गणपतीची मुर्ती आहे.
मंदिराचे सभोवताली ओवऱ्या असुन कऱ्हा तीरावर घाट बांधलेला आहे, पेशवे काळात
सखाराम बापू बोकील यांनी हा घाट बांधला व मंदिराचा जिर्णोधार केल्याचे
सांगितले जाते ,
सिद्धेश्वर मंदिर

सासवड पासुन २ किमी अंतरावर कऱ्हा नदीस पुरंदर किल्ला केदारेश्वर येथून
वाहणारा केदारगंगा ओढा जिथे मिळतो, त्या संगमा जवळ हे पूर्वाभिमुख मंदिर
नदीच्या पश्चिम काठावर आहे, सासवड पाणी पुरवठ्याचे पंपिंग स्टेशन जवळून
असणाऱ्या लोखंडी पुलावरून कऱ्हा नदी ओलांडून या मंदिराकडे जाता येते,
मंदिरा समोर कऱ्हा नदी काठी छोटासा घाट असुन मंदिरासमोर एका मेघडंबरी मध्ये
नंदी प्रतिमा आहे येथील अवशेषा वरून जुन्याकाळी या मंदिरास कोट असावा असे
वाटते,

पूर्वाभिमुख दगडी मंदिराची रचना मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे, नंदी
पुढील पुर्वद्वारा शिवाय मंडपास उत्तर व दक्षिण बाजूनेही प्रवेशद्वार आहेत
मंडपात पश्चिम बाजुस गर्भगृहाचे प्रवेशद्वाराचे शेजारील भिंतीत दोन देवड्या
असुन दक्षिण बाजूचे देवडीत गणेश प्रतिमा आहे तर उत्तर बाजूचे देवडीत
विष्णू प्रतिमा आहे, मंडपाचे पुढे छोटेसे अंतराळ असे त्यापुढे नक्षीकामाने
नटलेले गर्भगृहाचे प्रवेश द्वार आहे

गर्भगृहाचे प्रवेश द्वारातून पायरी उतरून गर्भगृहात जावे लागते, गर्भगृहात
मध्यभागी सिद्धेश्वराचे शिवलिंग असुन लिंगा मागील पश्चिम बाजुस कोनाड्यात
पार्वतीची मुर्ती आहे
या मंदिराचे बांधकामावरून हे पेशवे कालीन असावे असे वाटते, नितांत सुंदर रमणीय शांत परिसर असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच.
पुरंदरे वाडा

पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ याचे दिवाण अबजीपंत पुरंदरे यांनी हा वाडा ईस
१७१० मध्ये बांधला, याच वाड्याचे बाधकाम करणाऱ्या कलाकारांनी पुढे ईस १७३०
मध्ये पुण्याचे शनिवार वाड्याचे बांधकाम केले. या वाड्याची तटबंदी सुमारे
८० फूट उंचीची असुन प्रवेशद्वार सुमारे २० फूट उंचीचे आहे, वाड्यामधील
लाकडी बांधकाम अजून उभे आहे, सासवड मधील बाळाजी विश्वनाथ पेशवे, अनेकांचे
वाडे नष्ट झाले असुन पुरंदरे वाडा आपल्या गतस्मृती सांभाळत आजही उभा आहे.
पुरंदर किल्ला

जेजुरी पासून ३३ किमी अंतरावर असणारा पुरंदर किल्ला स्वराज्याचे प्रमुख
शिलेदारा पेंकी एक, हा किल्ला समुद्र सपाटी पासुन १३८५ मीटर उंचीवर असून.
ईस अकराव्या शतका पासून हा किल्ला अस्तित्वात असल्याचे संदर्भ मिळतात,
यादव, निजाम, बहामनी,यांच्या राजवटी या किल्ल्याने पहिल्या. पहिल्या
आदिलशहा कडे असणारा हा किल्ला येथील किल्लेदाराचे मृत्यु ने निर्माण
झालेल्या वारसांचे वादात मध्यस्ती करून त्यांना आपल्या सेवेत सामावत
शिवरायांनी या किल्ला स्वराज्यात आणला. स्वराज्याचे सुरवातीचे मनसुभे याच
गडावर घडले. दिलेरखानाने पुरंदरला दिलेल्या वेढ्यात त्याचे अमिष नाकारून
स्वराज्यासाठी आपली आहुती देणाऱ्या मुरारबाजी च्या रणयज्ञाचा हा साक्षीदार
शौर्याची स्पुर्ती जागवित उभा आहे,

गाडी मार्ग थेट किल्ल्याचे प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचलेला आहे . नारायण पेठ या पायथ्याच्या गावातून पायवाटेने ही सर दरवाज्या मधून किल्यावर पोहचता येते. पुरंदरच्या पुरंदर माचीवर हे दोन्ही रस्ते पोहचतात. किल्याचे सर दरवाज्या कडील तटबंदी काहीशी सुस्थितीत असुन दक्षिण बाजुच्या महाकाळ माची व बावची माची यांची तटबंदी काळाचे ओघात नष्ट झाली आहे.

पुरंदर माचीवर पश्चिमेस पद्मावती तलाव व पूर्वेस राजळे तलाव आहेत

याच माचीवर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा उभारण्यात आला असुन

बहिरव खिंडी जवळ शिवरायाचा पुतळा आहे याच भगत पूर्वी बहिरव दरवाजा होता.

माचीवर पुरंदरेश्वराचे मंदिर आहे हा किल्ल्याचा अधिपती देव या मंदिरास छोटासा कोट असुन मंदिरा समोर नंदी मेघडंबरी आहे मंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात पुरंदरेश्वर शिवलिंग व मागील बाजुस पार्वतीची मुर्ती आहे. या मंदिरा शेजारी बांधीव सुंदर आड आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोधार करण्यात आला होता.

या मंदिराचे पश्चिमेस रामेश्वराचे पेशवे कालीन मंदिर आहे. किल्ल्यास जुन्याकाळी पाच दरवाजे असल्याचे सांगतात पण आज फक्त सर दरवाज्याच अस्तित्वात आहे.

पुरंदरेश्वर मंदिराचे शेजारील चढणीच्या पायवाटेने व काही पायऱ्या चढून
बालेकिल्याचे बिन्नी दरवाज्यात पोहचता येते. या दरवाज्याचे बाहेरील बाजुस
हनुमान व लक्ष्मिआई याची स्थापना केलेली आहे. या दरवाज्या पुढे दोन दरवाजे
लागतात . बिन्नी दरवाज्यातून कंदकड्यावर पोहोचतो या कड्यावर पाण्याचे टाके
असुन जवळच विरुद्ध बाजुस तटाला चोर दरवाजा आहे.
बिन्नी दरवाज्यापुढे काही पायऱ्या चढल्यावर गणेश दरवाजा आहे. याचे डावे बाजुस कोनाड्यात गणेश मुर्ती आहे
याचे पुढे एक उत्तराभिमुख दरवाजा लागतो यास निशाण दरवाज्या म्हणतात याचे शेजारी निशाण बुरुज असुन त्यावर निशाण लावण्याचे जागा आहे.

येथील तटबंदी ला शेंद्र्या बुरुज असुन ईस १३८० दरम्यान या बुरुजाचे काम
करताना सारखे ढासळत होते .तेव्हा बिदरचा बादशहा महमूद याचे आदेशाने नाथनाक व
देवकाई या नवविवाहित दाम्पत्यास जिवंत गाडून हा बुरुज उभारण्यात आला. आजही
हा बुरुंज ही करून कहाणी सांगत उभा आहे.

याच्यापुढे साखरी तलाव असुन पुढे हत्ती च्या मस्तका प्रमाणे प्रमाणे
बांधलेला तिहेरी हत्ती बुरुज आहे त्याचे नैरुत्य दिशेस कोकण्या बुरुज आहे.
केदार टेकडीचे दक्षिण बाजुस केदार दरवाज्या आहे केदार दरवाज्या व बिन्नी
दरवाज्या याचे मध्ये सरळ असलेली तटबंदी आता नष्ट झाली आहे . केदार दरवाजा
हा संकट काळी रसद पुरविणारा व बचावासाठी उपयोगी दरवाजा

निशाण दरवाजा ओलांडून आत गेले की समोर दिसणाऱ्या टेकडीस राजगादी म्हणतात या
टेकडी वर काही पाण्याची टाकी, व अनेक जुन्या इमारतींचे भग्न अवशेष असुन या
ठिकाणी पूर्वी अनेक महत्वाचे वाडे होते . केदार टेकडी कडील उत्तरावर
दारूगोळ्याचे कोठाराचे भग्न अवशेष आहेत.

राजगादीचे पश्चिमेस केदार टेकडीची चढण काही अंतरावर सुरु होते.मंदिराचे
टेकडीवर जाण्यासाठी सुमारे ७० बांधीव पायरीचा मार्ग आहे. केदार टेकडी
किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. येथील अतिशय छोट्या पठारावर केदारेश्वराचे
पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिरा समोर नंदी मेघडंबरी आहे तिचे पुढील बाजुस
चोथरे व एक दीपमाळ आहे. गर्भगृहात केदारेश्वराचे शिवलिंग असुन मागील बाजुस
इंद्र मुर्ती आहे. या किल्ल्याचे पुरंदर हे नाव इंद्राचेच एक नाव आहे. या
मंदिरापासून केदारगंगा उगम पावते व सासवड जवळील सिद्धेश्वर मंदिराजवळ कर्हा
नदीस मिळते.
पुरंदर किल्ल्याचा इतिहास
पुरंदर म्हणजे इंद्र होय. या पर्वतावर गौतम ऋषीच्या शापातून मुक्ती
मिळविण्यासाठी इंद्राने येथे तप केले होते. म्हणून या किल्ल्याचे पर्वत
रांगेस इंद्रनील असे नाव लाभले होते. या मुळेच या पर्वतास पुरंदर नाव
प्राप्त झाले.
या किल्ल्याचे इतिहासातील नोंदी यादव पुर्वा काळापासून आढळतात. या किल्यावर यादवांचे राज्य होते.
ईस १३५० मध्ये बहामनी सत्तेच्या ताब्यात हा किल्ला गेला.
ईस १३८० बहामनी राज्या कडून किल्ला दुरुस्ती शेद्र्या बुरुंज उभारणीत नाकनाथ व देवकी या नवविवाहित जोडप्याचा बांधकामात गाडून बळी
ईस १४८६ अहमदनगर निजामशाही चे किल्ल्यावर राज्य
ईस १५९६ निजामशाहीने मालोजीराजाना जहागिरीत किल्ला दिला.
ईस १६२९ किल्ला आदिलशाही कडे

ईस १६४७ पुरंदरचा किल्लेदार महादजी निळकंठ यांचा मृत्यू, त्याचे मुलां मधील
वादात मध्यस्ती करून शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराजात आणला. स्वराज
स्थापनेच्या सुरवातीच्या कालखंडात महाराजांचे वास्तव्य याच गडावर,
स्वराज्याचे सुरवातीचे हालचाली येथूनच,
ईस १६४८ पहिली लढाई याच किल्या वरून कूच करून लढली व बेलसर येथे विजय मिळवला,

१४ मे १६५७ राणी सईबाई याच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म
५ सप्टे १६ राणी सईबाई यांचे निधन, कापूरहोळ च्या धाराऊ गाडे यांनी दुधमाता बनून संभाजीना वाढविले.
ईस १६६० पुरंदर वरून कूच करून पुण्यातील लालमहालात शाहिश्ते खानाची बोटे तोडली.
३० मार्च १६६५ पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाचा वेढा
१४ एप्रिल १६६५ दिलेरखान बरोबरील युद्धात वज्रगड पडला, पुरंदरावर मोघलांचा हल्ला.

एप्रिल, मे १६६५ पुरंदर किल्ला मराठ्यांनी नेटाने लढविला, वेढा तोडण्यासाठी
मुरारबाजी देशपांडे चे प्रयत्न, वेढा तोडण्यासाठी पराक्रमाची शर्थ
दिलेरखाना बरोबरील युद्धात मुरारबाजींना वीर मरण. ( मुरारबाजी जन्म -१६१६,
महाड ) मराठ्यांनी पुरंदरचा लढा सुरूच ठेवला.
१३ जुन १६६५ पुरंदरच्या पायथ्याशी जयसिह व शिवराय चर्चा होऊन पुरंदरचा तह किल्ला मोघलांचे ताब्यात
८ मार्च १६७० निळोपंत मुजुमदारांनी किल्ला स्वराजात आणला.
ईस १६८९ किल्ला मोघला कडे औरंगजेबाने किल्लाचे नाव आझमगड ठेवले
ईस १६९१ किल्ला स्वराज्यात परत
ईस १७०५ किल्ला मोघला कडे
ईस १७०५ भोरचे पंत सचिवानी किल्ला मोघलांकडून परत मिळवला
ईस १७०७ किल्ल्यावर छत्रपती शाहूचे वास्तव्य
ईस १७१३ छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यात बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पदाची वस्त्र दिली, पेशवे परिवाराचा किल्ल्यावर निवास.
ईस १७२७ चिमाजी अप्पांनी किल्ल्यावर मराठ्यांची टांकसाळ सुरु केली.
ईस १७६४ गडकरी अत्र्यान विरुद्ध जुन्या गडकर्याचे बंड मजूर म्हणून किल्ल्यात प्रवेश, गवतात लपविलेल्या तलवारीनी हल्ला गडावर कब्जा.
ईस १७७४ नारायणराव पेशव्यांच्या गरोदर पत्नी गडावर निवासास, १८ एप्रिल १७७४
सवाई माधवरावांचा जन्म, वयाचे ४० व्या दिवशी पेशवे पदाची वस्त्र, पेशवाईचा
कारभार गडावरून.
ईस १८१८ गड इंग्रजांचे ताब्यात
ईस १९६१ गडावर लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने सुरु केली, तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही के कृष्णमेनन यांचे हस्ते उद्घाटन.
१९ एप्रिल १९७० मुरारबाजी पुतळ्याचे अनावरण
ईस १९७९ किल्ल्यावरील लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने हलवली
वज्रगड
वज्रगड अथवा रुद्रमाळ हा पुरंदरचा जुळा किल्ला हा समुद्र सपाटी पासून १३४८ मीटर उंचीवर आहे पुरंदर व वज्रगड यांचे मध्ये भैरव खिंड आहे. पुरंदरच्या माचीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळील रस्त्याने वज्रगडावर पोहचता येते, पायथ्याचे भिवडी गावा जवळील रडतोंडीच्या घाटाने पाउल वाटेने येथे पोहचता येते.

दोन्ही रस्त्याने चढून आल्यावर खडकात खोदलेल्या व बाजुला तट असलेल्या पायरी मार्गाने

वज्रगडाचे महाद्वारात पोहचता येते. महाद्वारा पुढे अजून एक दरवाजा लागतो.

या दरवाज्यातून आत गेल्यावर खडकाचे प्रचंड सुळके दिसतात या उंच कातळांचा उपयोग प्रस्तरारोहण प्रशिक्षणा साठी केला जातो. हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. किल्ल्याचे घेर्यास तटबंदी असुन टिळा ५ बुरुज आहेत.

तटबंदी मधील एका भग्न छोट्या दरवाजा तून उतरून किल्ल्याचे माचीवर जाता येते.

या माचीवर एक तीन भागात खोदलेले तळे असुन

याचे काठावर मारुती मंदिर असुन

रुद्रेश्वर शिव मंदिर आहे या रुद्रेश्वरा वरून या किल्ल्या रुद्रमाळ हे नाव मिळाले. हा या किल्ल्याचा अधिपती देव, पुरंदर हे इंद्राचे नाव आहे व इंद्राचे शस्त्र वज्र म्हणून पुरंदर शेजारी असलेला किल्ला म्हणून त्याला वज्रगड हे नावही प्राप्त झाले आहे. या मंदिरांचे पुढे काही अंतरावर पडलेले अवशेष आहेत या ठिकाणी काही काळ आद्यक्रांतिवीर उमाजी नाइक यांचे वास्तव्य होते. किल्ल्याचे वायव्ये कडील बुरजास जोडणारी एक डोंगराची उतरणारी डोंगराची सोंड आहे.या सोंडेच्या वरील तिसर्या टप्प्यावर उत्तानदेवाचे स्थान आहे. सोंडेच्या पायथ्याला कपिलेश्वर शिवस्थान आहे या वरून या सोंडेस कपिलधार असे म्हणतात.

वज्रगडाचे बांधकामा विषयी निश्चीत माहिती उपलब्ध नाही. पण शिवपूर्व
काळापासून त्याचे उल्लेख आढळतात ईस १६६५ मध्ये दिलेरखानाने पुरंदरला वेढा
दिला व पुरंदर मिळविण्यासाठी त्याने प्रथम वज्रगड घेण्याचा प्रयत्न सुरु
केला. वज्रगडाचे कपिलधारे वरून सेन्यासह तीन तोफा चढविण्यास सुरवात केली,
गडा वरील मावळ्यांचा तीव्र प्रतिकार झेलत या तोफा वर आणल्या गेल्या.
वज्रगडाचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभु, व बाबाजी बुवाजी प्रभु. यांनी गड
राखण्यासाठी निकराची झुंज दिली ३० मार्च १६६५ ते १४ एप्रिल १६६५ त्यांनी
किल्ला ३०० मावळ्यांचे साह्याने लढविला. तोफांचे मार्याने किल्ल्याचा
वायव्य बुरुंज ढासळला, व वज्रगड मोघ्लांचे ताब्यात गेला.
पुरंदर व वज्रगडा वरील पुष्प वैभव

राम रावण यांच्या लंके मधील युद्धात मुर्चित पडलेल्या लक्ष्मणाला सावध
करण्यासाठी लागणारी संजीवनी वनस्पती साठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून
नेला या पर्वतातील भाग म्हणजे हा इंद्रनील पर्वत, इंद्रनील म्हणजेच पुरंदर
असे वर्णन संत नामदेवांनी केलेले आहे. पुरंदर – वज्रगड येथील ओषधी वनस्पती
व पुष्प वैभवासाठी प्रसिद्ध आहे.
पुरंदरचे भोगोलिक स्थान त्याची उंची, माती ,पावसाचे प्रमाण यामुळे
हवामानाची वेगळी देण या पर्वतास लाभली आहे , पुरंदर वज्रगडाचे डोंगर माथे
पावसाळ्या मध्ये गवताने झाकलेले असतात, या डोंगर माथ्यावर मोठो झाडे झुडपे
वाढू शकत नाहीत त्यामुळे जास्त पावसात मोठ्या उंचीवर वाढणाऱ्या खुरट्या
वनस्पतींची जैवविविधता येथे आढळते. सह्याद्री मधील कळसुबाई, हिमालयातील
काही भाग व अफगाणीस्तान, दक्षिणेतील अण्णामलाई येथील भागात आढळणाऱ्या काही
वनस्पती येथे आढळतात. तर काही दुर्मिळ वनस्पती याच किल्ल्यावर आढळतात

ईस १९४५ मध्ये इंग्रज प्रशिक्षक फादर संतापो यांनी आपल्या पुरंदर येथील
वास्तव्यात येथील वनस्पती व फुलांचा अभ्यास केला त्यांनी आपल्या ‘फ्लोरा ऑफ
पुरंदर’ या पुस्तकात येथील सुमारे ६०० वन्य वनस्पतींची नोंद केली आहे.
पावसाला सुरु झाल्यावर येथील पुष्प वैभव आकारू लागते ऑगष्ट, सप्टेबर,
ऑक्टोबर महिन्यात हा परिसर आपल्या पुष्प वैभवाने नटू लागतो. प्रत्येक
महिन्यात वेगळेच पुष्प वैभव जन्म घेते, अगदी मार्च महिन्यात सुद्धा येथील
काही फुले फुलतात. या पुष्प वैभवाची ही छोटीशी झलक
मल्हारगड

जेजुरी पासून २३ किमी असणारा हा किल्ला किल्ल्याचे पायथ्याशी असणारे सोनोरी
गावा मुळे सोनोरीचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. पेशव्यांचे तोपखाना
प्रमुख पानसेचे सोनोरी हे इनाम गाव या गावात त्यांचा भुईकोट किल्ला आहे.
याच पानसे परिवारातील भिवराव व कृष्णाजी पानसे यांनी ईस १७५७ ते ६० चे
दरम्यान हा किल्ला बांधला व आपले कुलदेवत असणारे खंडोबाचे नावावरून या गडास
मल्हारगड असे नाव दिले. ऐतिहासात बांधला गेलेला हा शेवटचा किल्ला म्हणून
ओळखला जातो. गडावर बांधकाम सुस्थितीत असून खंडोबा व महादेव यांची छोटी
मंदिरे आहेत खंडोबा मंदिरात खंडोबाची अश्वरूढ दगडी मूर्ती आहे
यमाई देवी ( शिवरी )

जेजुरी पासुन ७ किमी असलेले शिवरी गावाचे फाट्या वर हे यमाई देवीचे मंदिर
आहे, एका बंदिस्थ प्राकारात पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना सदर,
मंडप, गर्भगृह अशी आहे.गर्भ गृहात देवीचा तांदळा व महिषासुर मर्दिनी यमाईची
मूर्ती आहे, सातारा जिल्ह्यामधील औध येथील यमाई एका भक्ताचे भक्तीने येथे
आल्याचे सांगितले जाते.
नारायणेश्वर (नारायणपूर)

जेजुरी पासून ३० किमी वर पुरंदर किल्ल्याचे पायथ्याशी असणारे गाव पूर्वी
पुरंदर किल्ल्याची बाजारपेठ होते, या ठिकाणी सुमारे अकराव्या शतकातील हे
नारायणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. दगडी कालाकुसरीने युक्त असणारे हे मंदिर
एका उधवस्त दगडी प्राकारात असून मंदिरातील दगडी खांब कोरीव असून गर्भगृहाचा
दरवाजा नक्षीकामाने युक्त आहे. गर्भगृहात शिवलिंगाचे योनी मध्ये खोलात
लिंग आहेत. मंदिराचे जवळ इंद्रायणी कुडा आहे.

मंदिराचे जवळ अलीकडे बांधलेले एक मुखी दत्ताचे मंदिर असून येथे गुरुवारी व दत्तजयंती सोहळ्यास मोठी यात्रा भरते.
प्रती बालाजी मंदिर (केतकवळे)

जेजुरी पासून ३५ किमी अंतरावरील केतकवळे गावी अलीकडे राव यांचे धर्मादाय
संस्थेने हे मंदिर उभारले आहे तिरुपती बालाजी मंदिराची ही देखणी प्रतिकृती
असून तिरुपती मंदिरा प्रमाणेच येथील धार्मिक दिनक्रम असतो , रात्रीच्या
वेळी रोषनाईने उजळलेले मंदिर अतिशय सुंदर दिसते
श्रीनाथ म्हस्कोबा (वीर)

जेजुरी पासून ४५ किमी अंतरावर असणारे वीर गावी हे मंदिर आहे. एका दगडी
बांधकाम असणारे भव्य प्राकारात हे भव्य मंदिर आहे पूर्वाभिमुख मंदिराची
सदर, मंडप , गर्भगृह अशी रचना असून गर्भगृहात श्रीनाथ जोगेश्वरी यांच्या
मूर्ती आहेत या वारुळा पासून तयार झालेची लोकश्रद्धा आहे. श्रीनाथ हे काशी
अथवा सोनारी चे काळबहिरव असून ते कमळोजी नामक भक्तामुळे या ठिकाणी
वास्त्यव्यास आल्याचे सांगितले जाते हा देव स्मशान भूमीत प्रगट झालेने यास
म्हस्कोबा असेही म्हणतात. माघ पौर्णिमा ते वद्य दशमी पर्यंत येथे दहा दिवस
यात्रा भरते. माघ पौर्णिमेस रात्री बारा वाजता पालख्यांची मिरवणूक निघते व
पहाटे २.३० ला देवाचे लग्न लागते. वद्य पंचमी पासून भाकणूक ( भविष्य वाणी)
सुरु होते,वद्य दशमीस दुपारनंतर गुलालाचा रंग करून भाविकावर शिपला जातो
याला मारामारी म्हणतात. प्रसाद घेऊन या यात्रे चा समारोप होतो.
कानिफनाथ (बोपगाव)

जेजुरी पासून २५ किमी अंतरावरील बोपगाव पासून ५ किमी अंतरावर समुद्र
सपाटीपासून ९६० मीटर उंचीवर असणारे टेकडीवर हे कानिफनाथ मंदिर आहे. गाडी
रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोहचता येते.पूर्वाभिमुख असणाऱ्या मंदिराची
रचना मंडप व गर्भगृह अशी आहे. मंदिरातून गर्भगृहात जाण्यासाठी एक लहान
कोनाडा असून या कोनाड्यातून झोपून सरपटत गर्भगृहात जावे लागते, गर्भगृहात
कानिफनाथांची समाधी आहे. कानिफनाथ हे नवनाथा मधील एक नाथ यांचा जन्म
हत्तीच्या कानातून जाहला म्हणून यांना कानिफनाथ असे म्हणतात अशी जनश्रुती
आहे.
चतुर्मुख ( गराडे)

जेजुरी पासून २९ किमी असलेल्या गराडे गावाचे दरेवाडी जवळ २ किमी अंतरावरील
एका टेकडीच्या मध्यावर हे मंदिर आहे. या टेकडीची समुद्र सपाटी पासून उंची
१०२० मीटर असून छोट्या पूर्वाभिमुख मंदिरास नव्याने मंडप बांधला आहे.
गर्भगृहात शिवलिंग आहे.हे ठिकाण ब्रम्हदेवांची तपोभूमी होती या ठिकाणी
ब्रम्हदेव तप करत असताना पांडेश्वर येथे यज्ञ करीत असलेल्या पांडवानी
गंगाजला साठी त्यांचा कमंडलू लवंडला व त्या जल प्रवाहा मधून कर्हा व
चर्नावती या नद्या उगम पावल्याचे मानले जाते. मंदिराची उत्तर बाजूने
चर्नावती व दक्षिण बाजूने कर्हा नदी उगम पावते. कर्हेचा स्पष्ट रुपात
वाहणारा प्रवाह दरेवाडी येथून दिसू लागतो येथे काठावर कर्हामाई चे छोटे
मंदिर आहे, गराडे गावात नदीवर छोटा घाट असून तेथे शिव मंदिरे आहेत यातील
एका मंदिरास ही चतुर्मुख मंदिर म्हटले जाते
हरेश्वर

जेजुरी पासून २० किमी अंतरावर असणारे हे ठिकाण सासवड वीर रोडवर सासवड पासून
५ किमी अंतरावर पिंपळे गावाजवळ समुद्र सपाटी पासून ९३० मी उंचीवर असलेल्या
टेकडीवर आहे . रस्त्यापासून मोठी चढण चढून टेकडीवर जावे लागते. टेकडीवर
पूर्वाभिमुख शिवमंदिर असून टेकडीच्या दुसरया टोकावर दत्तमंदिर आहे
दत्तमंदिरात एका छोट्या कोनाड्यातून जावे लागते. या टेकडीवरून पुरंदर
वज्रगडा पासून पुरंदर तालुक्याचा जवळ जवळ सर्वच परिसर दृष्टीस पडतो. भटकंती
करणाऱ्या भटक्या साठी सुंदर ठिकाण
वाघजाई ( पिंगोरी )

जेजुरी पासून १५ किमी अंतरावर असणारे पिंगोरी गावा मध्ये एका बंधिस्त
प्राकारात लाकडी मंडप व गर्भगृह अशी रचना असणारे मंदिरात वाघावर आरूढ
असलेले वाघजाई ची मूर्ती आहे हिला पिंगलाई असेही म्हणतात या मुळे या गावास
पिंगोरी नाव मिळाल्याचे मानले जाते. या मंदिराची मागे थोडे बाजूला एक शिव
मंदिर आहे. शिव मंदिराची समोर वाघजाई मंदिराचे बाजूस एक स्मारक छत्री असून
त्यात प्रतिमा आहेत. ग्वालियर चे शिंदे घराणे मुळचे महाराष्ट्रातील या
घराण्याची एक शाखा या ठिकाणी वास्तव्य करीत होती त्यांचे मधील कोणाची तरी
ही छत्री असल्याचे ग्रामस्थ सांगतात गावा मध्ये त्यांचा एक वाडा ही आहे.
मंदिराचे प्रवेशद्वारावर एक शिलालेख असून त्यावरून ईस १८१२ मध्ये सदर
दरवाज्याचे काम बापुजीराव विठ्ठल शिंदे पाटील यांनी वाघाई चरणी केल्याचे
दिसते
कोळविहीरे
जेजुरी पासून ६ किमी अंतरावर असणारे कोळविहीरे गाव हे रामायणकार वाल्मिकी ऋषी यांची तपोभूमी असल्याचे मानले जाते वाल्मिकी हे जातीने कोळी होते पूर्वाश्रमी ते या परिसरामध्ये वाल्याकोळी म्हणून वाटमारीचा धंदा करीत येथे असलेले एक विहीर वाल्या कोळ्याची म्हणून प्रसिद्ध होती या वरून या गावास कोळविहीरे असे नाव मिळाले. वाटमारी करताना वाल्या कोळ्यास नारादमुनीचा अनुग्रह मिळाला व त्याने तप आरंभले व वाल्याचा पुढे वाल्मिकी झाला. त्यांनी ज्या ठिकाणी तप केले त्या ठिकाणी दुर्मिळ असा पाडळी चा महावृक्ष आजही उभा असून तो तप करताना त्यांनी हाती घेतलेल्या काठी पासून निर्माण जाहला अशी जनश्रुती आहे
हरणी

जेजुरी पासून १८ किमी असलेल्या हरणी गावापासून २.५ किमी अंतरावरील डोंगरास
महादेवाचा डोंगर म्हणून ओळखतात समुद्र सपाटी पासून ७४० मीटर उंच टेकडीवर
महादेवाचे मंदिर आहे गाडी रस्ता थेट मंदिरा पर्यंत पोहोचतो मंदिराची रचना
दगडी मंडप व गर्भगृह अशी असून गर्भगृहात द्विलिंग असून ते शंकर व पार्वतीचे
असल्याचे सांगतात, एका भक्ता मुळे देव शिखर शिगनापूर अथवा सोमेश्वर येथून
या ठिकाणी आल्याचे सांगीतले जाते. या मंदिरा मागील टेकडीवर हरणाई देवी चे
मंदिर आहे या ठिकाणची ही आद्य देवता हिचे नावावरून गावास हरणी नाव
मिळाले.हरणाई मंदिराचे मागील बाजूस काही अंतरावर एक नाथ पंथीय समाधी असून
ती कानिफनाथाची असल्याचे सांगितले जाते. चैत्र शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या
दरम्यान येथे यात्रा भरते.
सोमेश्वर ( करंजे)

जेजुरी पासून २५ किमी अंतरावर असणारे हे मंदिर सोमायाचे करंजे म्हणून ओळखले
जाते एका भव्य प्राकारात येथे सोमेश्वरचे दगडी मंदिर होते. याचे गर्भगृह
कायम ठेऊन आत्ता या मंदिराला आधुनिक रूप प्राप्त झाले आहे . मंडप, गर्भगृह
अशी मंदिराची रचना असून गर्भगृहात सोमेश्वरचे शिवलिंग आहे. सती मालुबाई चे
भक्तीने सोमनाथाचे पुजे करिता तिलानेण्या करिता रात्री विमान येत असे.एके
दिवशी तीचा पती संशयाने पाठलाग करीत विमानाला धरून सोरटी सोमनाथला पोहचला व
ती परतताना तेथेच राहिला. आणि तीच्या आयुष्याची परवड सुरु झाली तरी तिने
भक्ती सोडली नाही. शेवटी देव तिचे भक्ती साठी येथे प्रगट झाले. व ती
शिवतत्वात विलीन झाली अशी जनश्रुती आहे. संपूर्ण श्रावण महिना येथे यात्रा
यात्रा असते श्रावणी सोमवारी मोठी यात्रा भरते. या कालावधीत मालुबाईस
दिलेल्या वचना प्रमाणे आजही देव सर्प रूपाने प्रगटतात अशी लोकश्रद्धा आहे
श्री ज्योतीलिंग ( गुळुंचे)

जेजुरी पासून २५ किमी अंतरावर गुळुंचे गावी असणारे हे मंदिर याची मंडप व
गर्भगृह अशी रचना आहे गर्भगृहात शिवलिंग आहे. हे मंदिर येथे कार्तिक
द्वादशीस भरणाऱ्या ‘ काटे बारस’ या यात्रे साठी विशेष प्रसिद्ध आहे या
दिवशी बाभळीच्या काट्यांचे फांद्यांचे मोठे ढिगावर भाविक भक्त उघड्या
अंगाने अंग झोकून उड्या मारतात
कुमजाई (टेकवडी)

जेजुरी पासून २१ किमी अंतरावर असलेल्या टेकवडी गावा पासून ५ किमी अंतरावर
कुमजाई देवीचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंडप, गर्भगृह अशी
मंदिराची रचना आहे. गर्भगृहात खोलात उतरून जावे लागते. खाली एक शिवलिंग
असून मागील बाजुस खाली व वरील कोनाड्यात महिषासुर मर्दीनी कुमजाई च्या
मूर्ती आहेंत. भुलेश्वराचे पत्नी कुमजाई येथे त्याचे वर रुसून येऊन
राहिल्याचे जनश्रुती आहे . मंदिराची आजूबाजूस इतर देवतांचे घुमटी आहेंत
राजराजेश्वर मंदिर ( आंबळे )

जेजुरी पासून १८ किमी अंतरावरील आंबळे गावात एका उधवस्त मोठ्या प्राकारात
हे दगडी बांधकामातील पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंडप व गर्भगृह अशी मंदिराची
रचना असून मंडप नक्षीकामाने युक्त आहे. कामावरून हे मंदिराचे काम पेशवाई
काळातील आहे हे निश्चीत. गर्भगृहात शिवलिंग असून मागील बाजूस शंकर पार्वती
यांची अलीगन मूर्ती आहे. मंदिरावरील कळसाचे काम विटांचे असून भग्न अवस्थेत
आहे मंदिराचे मागे राम, कृष्ण, व तुळजाभवानी गणपती यांची मंदिरे आहेंत.
गावा मध्ये अनेक पुरातन भव्य वाडे असून गावाचा गावकोस आजही काही प्रमाणात
उभा आहे.
जवळार्जुन

जेजुरी पासून ६ किमी अंतरावर असलेले गाव या कर्हा नदी काठी पुर्व तटावर
पूर्वाभिमुख महादेवाचे मंदिर आहे .पांडेश्वर येथे यज्ञ करणाऱ्या पांडवानी
गंगा जलासाठी चतुर्मुखा वरील ब्रह्मदेवाचा कमंडलू लवंडला त्यातून कर्हा
निर्माण झाली. तपोभंगाने क्रोधीत ब्रम्हदेव अर्जुनाचा पाठलाग करू लागले.
ब्रम्हदेव जवळ आले की अर्जुन आपल्या हातातील बेल अक्षता खाली टाकीत असे
त्या ठिकाणी शिवलिंग निर्माण होत असे त्याची पुजा करून ब्रम्हदेव अर्जुनाचा
पाठलाग पुन्हा सुरु करीत या पद्धतीने कर्हा नदी काठी अनेक शिवलिंग निर्माण
झालेची जनश्रुती आहे. या मधील हे एक शिवलिंग अर्जुन पांडेश्वरा जवळ आलेवर
तयार जाहलेले शिवलिंग म्हणून हे जवळार्जुन शिवलिंग या वरूनच या गावास
जवळार्जुन नाव मिळाले आहे






















































































































































































































































































.jpg)







कानिफनाथ सापडली.
जय जय कानिफनाथ भगवान् योगीराज मुर्ती ।
पतिपावना ओवाळू तुज सदभावे आरती ॥ ध्रु.॥
ऋषभपुत्र श्रीप्रबुद्ध नामें नारायण मुर्ती ।
गजकर्णामध्ये षोडष वर्षे केली निजवस्ती ।।
नाथ जालिंदर कृपाप्रसादे वरिली ब्रम्हस्थिती ।
द्वादश वर्षे बद्रिकावनी केली तपपूर्ती ।।
नग्न देव उफराटे देही झोंबकळे घेती ।
विनम्र भावे वस्त्रे नेसवूनी मिळवी वरप्राप्ती ।।
जयजय...
गंध केशरी सुगंधी पुष्पें अत्तराची प्रीती ।
नेसूनी रेशमी वस्त्र भरजरी कफनी मोहक ती ।।
सुवर्णमुद्रा कर्णी बोटीं मुद्रिका खुलती ।
सुवर्ण गुंफित रुद्राक्षांची माळ गळा रुळती ।।
सुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची ।
बालरवीसम तळपे मूर्ती दिनानाथा तुमची ।।
जयजय...
गादी मखमली लोड गालिचा शिबिका अंबारी ।
छत्रचामरे चौरी ढाळती होऊनी हर्षभरी ।।
चाले निशाण पुढती वाजे वाजंत्री भेरी ।
भालदार चोपदार गाती बिद्रावळी गजरी ।।
सत् शिष्यांचा मेळा संगे फिरसी अवनीवरी ।
हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णू कोठवरी ।।
जयजय...
नाथा तुमचा राजयोग परी विरक्तता विषयीं ।
स्त्रीराज्यामध्ये मच्छिंद्रनाथें परिक्षियले समयी ।।
प्रेमे गोपीचंद रक्षिला असूनीया अपराधी ।
जती जालिंदर प्रसन झाले केवळ कृपानिधी ।।
जन उपकारासाठी साबरी विद्या निर्मियली ।
सिद्धाहातीं ओपुनी अवनीवरती विस्तारीली ।।
जयजय...
अवनी भ्रमूनी निजपंथाची महती वाढविली ।
समाधी स्थापूनी स्वानंदाने मढी पावन केली ।।
समाधिस्त परी अवनीवरी गुप्तरुपे फिरसी ।
जो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहिसी ।।
गोरक्षांकित विठामाईचा दास गुरु भजनी ।
तव गुण गाता आनंद झाला लीन सदा चरणी ।।
जयजय...