विष्णू
(सुरुवातीपासून सुमारे सहाव्या शतकापर्यंत)सृष्टीच्या तीन स्थिती अर्थात् उत्पत्ती, स्थिती आणि लय, यांच्या आधारभूत देवता म्हणून ब्रह्मदेव, विष्णू व शंकर यांस मान्यता आहे. त्यापैकीं येथे विष्णूचा विचार करू.
विष्णूच्या मान्यतेचे धागेदोरे ऋग्वेदांपर्यंत पोहोचलेले आहेत. ऋग्वेदांच्या एकूण सहा सूक्तांत' त्याचे उल्लेख मिळतात.
या सूक्ताचा साकल्यानें विचार केल्यास खालील गोष्टी दृष्टोत्पत्तीस येतात.
१) इतर देवताच्या मानाने विष्णूशी संबंधित सूक्तांची संख्या फारच थोडी असली तरी त्यांत केलेले वर्णन मात्र अत्यंत उदात्त व भव्य स्वरूपाचे आहे.
२) कोणत्याही सूक्तांत मूर्तिविज्ञानाच्या दृष्टीनें विष्णूंचे स्वरूप वर्णन मिळत नाही, पण त्यानें तीन पावलांत पृथ्वी, अंतरिक्ष व इतर सर्व लोक व्यापून टाकले याबद्दल त्याची वारंवार स्तुती आहे. 'उरुगाय,' 'उरुक्रम' वगैरे विष्णूंची वैदिक नांवे पुढील युगांत वर्णन केलेल्या त्रिविक्रम रूपाशी संबंधित आहेत. 'विष्णूंच्या दोनच पावलांना माणसे पाहू शकतात, त्याचे तिसरे पाऊल अर्थात् परमपद याकडें विद्वान लोक टकमक बघत असतील' (१,२२.२०) वगैरे वर्णन त्यांच्या त्रिविक्रमत्वाचेच होय. एक सूक्त (७.१००,४) असेंही सुचवितें की विष्णूनें शेतीसाठी व मनुष्यांना राहण्यासाठी पृथ्वीचे तीन वेळा आक्रमण केले.
३) विष्णूजवळ अमृताचा अक्षय झरा आहे, असेच अतिशय चपळ आणि अनेक शिंगे असलेल्या दिव्य गाई ही आहेत.
४) विष्णुभक्तीचे मूळ ही आपणांस येथे सापडतें. विष्णूच्या अमाप प्रभावानें प्रेरित होऊन त्याला हाक मारल्यास (म्हणजे भक्ति केल्यास) तो येऊन उभा राहतो व (भक्तांचे) संरक्षण करतो ही कल्पना वैदिक काळातच रूढ झाली होती.
ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तांत सांगितलेला 'वराट' हा नारायण किंवा विष्णूचेच स्वरूप होय असेही विद्वानांचे मत आहे. शुक्लयजुर्वेदाच्या उत्तरनारायण भागांत 'पुरुषाच्या' श्री व लक्ष्मी अशा दोन पत्नीचेही उल्लेख सापडतात. उत्तर वैदिक काळांपासून विष्णुचे महत्त्व वाढू लागले. या गोष्टीस 'पाञ्चरात्र' मतानेंही बरीच मदत केली. परंपरेंप्रमाणें या शास्त्राचा उगम शुक्ल यजुर्वेदाच्या 'एकायनशाखा' या नांवानें ओळखल्या जाणाऱ्या काण्वशाखेपासून आहे. पुढे पाञ्चरात्र वाङ्मयाचा विस्तार फार मोठा झाला व त्यांत अनेक संहिता, आगम व उपनिषदें तयार झाली. महाभारतादि ग्रंथ व पुराणसाहित्य यावरही त्यांचा चांगलाच प्रभाव पडला. पाञ्चरात्र मतानें वासुदेव विष्णुसह संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध असे चार व्यूह कल्पून यांच्या उपासनापद्धतीवर जोर दिला व त्यातूनच पुढें विष्णूची चोवीस रूपें एकोणचाळीस पर्यंत अवतारांची संख्या, मंडलें व परिवार देवता या सर्वांचा उदय झाला.
विष्णुपूजेच्या विकसित स्वरूपाचे दर्शन महाभारतांत व भागवतादि अनेक पुरातनग्रंथात होते. विष्णू हा देवाधिदेव आहे, भक्तांच्या हाकेला ओ देऊन वैकुंठ लोकात निवास करणारा हा देव धाऊन येतो, देवांचा छळ करणाऱ्या दैत्य व असुरांचा संहार करून 'साधूचे परित्राण' व 'धर्मस्थापना' या करिता हा युगांयुगांत अवतार घेतो, जरूरी प्रमाणे हे अवतार पशु, पक्षी किंवा मनुष्यरूपात असतात. कधीकधी कपटानें विरोधकांत नास्तिक मतांची स्थापना करण्यांकरिताही तो अवतार घेतो, वगैरे विचारांची मांडणी, या ग्रंथात सापडते व ती समाजात ही दृढमूल झालेली दिसते, हा देव सात्विक प्रवृत्तीचा असून लोकरंजन व लोकमंगल करणारा आहे.
'तंत्र' मताने ही विष्णूच्या उपासनेचे विवेचन केले आहे, पण आता ते शैव किंवा नाही. 'अभिचारिक' स्वरूपाची विष्णू-मूर्ती प्रामुख्यानें आढळल्याचे ऐकिवांत नाही.
प्रतिमाशास्त्राच्या क्षेत्रात विचार केल्यास आजपर्यंत भारतीय कर्लेत कुषाण काळाच्या पूर्वी उत्तरभारतांत विष्णुप्रतिमा आढळल्याचे माहीत नाही. कृषाण काळ अर्थात् सुमारे इसवी सनाच्या पहिल्यापासून तिसऱ्या शतकांच्या दरम्यानचा काळ! या काळांत मथुरा व तिच्या आसपास लोक विष्णूंच्या मूर्ती घडवित असत. या प्रकारच्या बऱ्याचशा प्रतिमा आज अनेक ठिकाणी सुरक्षित आहे. त्यामुळे पर्यायाने असे गृहीत धरले पाहिजे कीं जरी कुषाण काळाच्या पूर्वीची विष्णुप्रतिमा आज प्रत्यक्ष उपलब्ध नसली तरी तिच्या निर्मितीची मुळे बरीच मागें पर्यंत गेलेली असावीत. ही गोष्ट नाण्यांकडे लक्ष दिल्यास आपोआप सिद्ध होते.
जुन्या नाण्यांवर विष्णू :
सुरुवातीपासून कुषाणकाळापर्यंतच्या सोने, चांदी व तांब्याच्या नाण्यावर शिव, सूर्य, कार्तिकेय, वगैरे तर दिसतात, पण विष्णूचे मात्र क्वचितच दर्शन घडतें पांचाल शासक विष्णुमित्र याच्या (इ.पू. १ले शतक) नाण्यांवर विष्णू आहे पण छोट्या आकाराच्या नाण्यावरील प्रतिमेचा आयुधादिकाच्या दृष्टीनें खोल अभ्यास करणें शक्य नाही. पण या उलट ऐखनूम येथे मिळालेल्या भारतीय ग्रीक राजा अँगथोक्लियस (सु. १८०-६५ ई.पू.) यांच्या नाण्यावर कृष्णबलराम स्पष्टपणे आढळतात. त्याचा विचार आपण पुढे करू. कुषाण राजा हुविष्क यांच्या एका नाण्यावर विष्णू आहे असें दिनेशचंद्र सरकारचे मत आहे, पण ते सर्वसामान्य नाही. पण याच काळातील एका दुसऱ्या तांब्याच्या शिक्यावर स्पष्टपणें एक सुंदर विष्णू आहे. त्यांच्या खालच्या उजव्या हातांत गदा, वरील हातांत एक गोल वस्तू, वर डावीकडे शंख (?) आणि खालच्या हातांत चक्र आहे. विष्णूचें शरीर चांगले गुटगुटीत असून त्याच्या समोर मुकुट घातलेला एक पुरुष हात जोडून उभा आहे.कुषाण राज्याच्या नाण्यांवर विष्णू नाही. गुप्तांच्या नाण्यांवर गरुड, गरुडध्वज हे तर दिसतात पण प्रत्यक्ष विष्णु फक्त 'चक्रविक्रम' प्रकारच्या नाण्यांवर आहे.

कुषाण कालीन विष्णूचे साधारण स्वरूप :
या काळातील सुमारें ५० प्रतिमा आपणास माहीत आहेत. त्यांपैकी सुमारे ४० मधुरेच्या क्षेत्रांतच मिळालेल्या आहेत. त्यावरून कुषाण कालीन विष्णू प्रतिमेचे सामान्य स्वरूप ठरविणें सोपे आहे. त्याची साधारण रुपरेषा खालीलप्रमाणें दाखविता येईल !१) ह्या सर्वच प्रतिमा आकारांत लहान असून इकडून तिकडे हलविण्यांस आटोपशीर अशा आहेत.
२) विष्णु मूर्तीची घडण यक्ष-प्रतिमेंवर आधारलेली आहे. इसवीसनाच्या सुमारे तीन शतकें आधीपासून लहान- मोठ्या आकाराच्या यक्ष मूर्ति बऱ्याच लोकप्रिय होत्या. अभयमुद्रेत उचललेला उजवा हात, कमरेवर ठेवलेला डावा हात, दोन्ही भुवयांच्या मध्यें ठळकपणे दिसणारे गोल 'उर्णा' चिन्ह, समभंग स्थितीत ताठ उभे राहण्याची कथित पद्धत, काष्टा घालून पुढें सोगा सोडलेले नेसूचे धोतर व मोजके दागिने ही यक्ष प्रतिमांची वैशिष्ठ्ये होत. कुषाण कालीन विष्णुप्रतिमेंत या सर्व गोष्टी दिसतात.
३) क्वचित अपवाद वगळल्यास सर्व प्रतिमा चतुर्भुज असून त्यांत प्रदक्षिणाक्रमानें गदा, चक्र, शंख किंवा काही नामोजक्या स्थानी जलपात्र, अशी आयुधे आढळतात.
४) उजवा हात अभय मुद्रेत असणें हें देवत्वाचे द्योतक होय व म्हणूनच हे लक्षण बुद्ध, लक्ष्मी, कार्तिकेय वगैरे प्रमाणें विष्णुप्रतिमेंत ही दिसते. या हातांत कोणतेही आयुध देत नसतात. मात्र बुद्धाच्या व विष्णूंच्या अभय मुद्रेत दिसणाऱ्या तळहातांवरचा एक फरक लक्षांत ठेवण्यांसारखा आहे. बुद्ध, बोधिसत्त्व, जैन तीर्थकर वगैरेंच्या तळहातांवर चक्र त्रिरत्न व बोटांच्या पेरांवर स्वस्तिक, शंख, श्रीवत्स आदि मंगलचिन्हे दिसतांत. पण विष्णूंच्या तळहातांवर मात्र त्यांचा पूर्ण अभाव आहे. विष्णूच्यावर उचलेल्या उजव्या हातांस 'उद्यतपाणि' असे ही संबोधन आहे व त्याचे विशेष महत्त्वही सांगितले आहे."
५) कुषाणकलेंत प्रामुख्यानें दिसणारी गोष्ट म्हणजे प्रतिमेंची 'उभयवर्ती' घडण (carving in round). दर्शनी भागांप्रमाणेंच कुषाण शिल्पांचा पाठीकडचा भागही लक्ष पुरविण्यांसारखा असतो. येथे पाठीचे सुंदर अंकन, तिजवर रुळणारा केशसंभार (र.चि. चौदा. २) अथवा फुलें व फळांनी बहारलेला एखादा वृक्ष दिसतो. कधी कधीं वृक्षांच्या फांद्यावर बसलेले पोपट व चिमुकल्या खारी स्वाभाविकर्तेत भर टाकतात. विष्णुशित्यांत बहुतेक देवाची पाठ दिसते. फक्त एका प्रतिमेत (म.सं.सं १४. ३९२-३९५ चित्र-६) वृक्षाचे दर्शन होते.
६) विष्णूच्या सामान्यापेक्षां जास्त असलेल्या दोन हातांची घडण सुद्धां विचार करण्यांसारखीं आहे. क्वचित अपवाद सोडले तर हे हात कुषाण कालीन मूर्तीत वर उचललेले असतात. ह्या प्रकांरास 'उद्बाहू' असें म्हणतात. हे हात खाद्यांपासूनच वेगळे झालेले दिसतात (रे. चि.तेरा. १ चौदा २)
काही कुषाणकालीन विष्णु मुर्ती
मिशा असलेला विष्णू
पीलीबंगा (हनुमान गट) राजस्थानात येथून उत्तर-कुषाण कालीन खडू (कॅओलीन) ची मूर्ती मिळाली आहे. हिचा छाती खालचा भाग तुटलेला असला तरी ही महत्त्वाची आहे. कारण येथे विष्णूच्या मिशा दाखवल्या आहेत, उजव्या हातांत गदेचे टोक आणि डाव्यात चक्र दिसते. विष्णूला मिशा हा गांधार कलेचा प्रभाव आहे. शंकराला देखील मिशा असलेल्या प्रतिमा तिकडे मिळाल्या आहेत. तूर्त हे शिल्प राजस्थान च्या बीकानेर संग्रहालयांत आहे.- R.C. Agrawala, Rajasthan Contribution to early Brahmanic Iconography IIA., Fig. 2, p. 14, 15
- रत्नचंद्र अग्रवाल, 'पीलीबंगा से प्राप्त विष्णू फलक', वैचारिकी बीकानेर, २५, (३), २००९, पृ. २०-२३.
मुकुट घातलेले विष्णूचरण
मथुरा येथून मिळालेल्या छोट्याश्या कुषाण कालीन बैठकीवर (तूर्त बर्लिन संग्रहालय) विष्णूच्या पायांना 'कुषाण पद्धतीचा उभयसाधारण असा मुकुट घातला आहे, त्याचा सोगा ही पाठी मागे दाखवला आहे. पावलाच्या डावीकडे चक्र आहे, उजवीकडे शंख किंवा गदा असू शकते. (रे.चि.वि. १)- N.P. Joshi, Workship of Visnu's Feet, a Unique representation, SS., VIII, 1995, PI. a,b p. 74; N.P. Joshi, Some Unique and Rase Sculptures, Kala, XI, 2004-05, p. 74.
द्विभुज विष्णू
पाली, राजस्थान येथून मिळालेली ही मूर्ती (तूर्त जोधपूर संग्रहालय) सुमारे ४-५ व्या शतकातील आहे. देव उभा असून प्रलम्ध पद्धतीचे दोन्ही हात खंडित आहेत उजव्या हातांत गदा होती, तिचा जमिनीवर टेकलेला गोळा अजून दिसतो. देवाचा उभा मुकुट, रूळणारी वनमाला आणि कमरेभोवती गुंडाळलेले उन्तरीय ही सुरेख आहे. (रे.चि.ति.२)Vaisnavism in Indian Art and Culture, Ed. R. Rarimoo, New Delhi 1987, Fig. 27 p 233
उजव्या हातांत दंड व डाव्या हातांत शंख घेतलेला सुमारे ३-४व्या शतकातील दोन हाताचा स्थानक विष्णू येल्लेश्वरम्, आंध्रप्रदेश येथे असल्याची नोंद झाली आहे.
I.K. Sarma, Fresh Evidence on Cult. of Narasimha IAH., 1990
गुप्तकालांतील परिवर्तनें :
कुषाणनंतर उत्तर भारतात गुप्त राजांची राजवट सुरू झाली. कुषाण कालानंतर विष्णूच्या प्रतिमा या गुप्त काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या प्रारंभा पासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पूर्णपणे विकसित झालेल्या दिसतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे गुप्त राजे हे स्वतः वैष्णव धर्माचे अनुयायी होते आणि ते स्वतःला परमभागवत म्हणत असत. राजश्रय मिळाल्यामुळे गुप्तांच्या कारकीर्दीत ब्राह्मणधर्माच्या मूर्तीचे वैविध्य वाढले. ह्या काळांपर्यंत निरनिराळ्या शास्त्रांचा ही चांगलाच विकास झाला होता. मूर्तिशास्त्र ही त्याला अपवाद नव्हते. या शास्त्राची कुषाण कालांत मुहूर्तमेढ रोवली गेली होती. आता तिच्यावरील इमल्यानें चांगलाच आकार घेतला. इकडे पुराण ग्रंथांचे संकलन पुरे झाले व त्यात मूर्तिनिर्माणांविषयी बरीचशी माहिती साठवली गेली. मत्स्यपुराण, अग्निपुराण वगैरेंनी या विषयांवर स्वतंत्र अध्याय लिहिले. विष्णू धर्मोत्तरांसारख्या उपपुराणांनी या विषयाचे विवेचन करण्यांसाठी खंडेच्या खंडे खर्ची घातली वराहमिहिरासारख्या ज्योतिष पंडितानें देखील याचा विचार केला.या काळात घडविलेल्या मूर्ती मोठ्या संख्येने सापडलेल्या नसल्या तरी कलात्मकदृष्ट्या खूपच सरस होत्या. याचे कारण असे की याच कालखंडामध्ये देवदेवतांच्या मूर्तीचे प्रमाणीकिकरण निश्चित केले असल्यामुळे मूर्तिकलेला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. गुप्त राजांच्या सार्वभौम राष्ट्र या संकल्पनेनी सर्व देश प्रभावित झाला होता. याच राजांच्या दरबारात प्रख्यात कवी, नाटककार कालिदास होता मानले जाते. या काळातील विशेषतः शिल्पकलेला आलेली परिपक्कता आणि प्रगल्भता ही ती काळामध्ये ध्वजगजाप्रमाणे मार्गदर्शक ठरलेली आहे. हा प्रभाव इतका खोलवर होता की तेराव्या शतकामध्ये झालेल्या मुस्लिमांच्या आक्रमणांमुळे लयास जाईपर्यंत गुप्त काळातील ही मार्गदर्शक तत्व टिकून होती. याबद्दल आनंदकुमारस्वामींसारखे थोर अभ्यासक असे म्हणतात, "इथे आपल्या आधीच्या काळातील आदिम गुणधर्म आणि तदअनुशंगानी येणारा अभिव्यक्तीमधला भाबड़ेपणा संपलेला होता. एकीकडे त्याचे आत्मसंतुलित सुसंस्कृत आणि काटेकोर शास्त्राने बध्द नियमावलीत बसवलेले स्वरूप असले तरीही दुसरीकडे अभिव्यक्तीमध्ये जीवनोन्मादाने भरलेला उल्हासित प्रकटीकरण दिसते. या काळापर्यंत किंवा आधीच्या काळातील असणारे परकीय प्रभाव पचवले गेले होते, एव्हढेच नाही तर त्यांचे पूर्ण भारतीयकरण झाले होते. प्राचीन काळापासून प्राप्त केलेल ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान हे कलेच्या अभिव्यक्तीशी तादात्म्य पावलेले दिसते. अनंतक ध्यासातून उमगलेले व अनुभूत झालेल्याचेच हे स्थूलीकरण होते. ज्ञानेंद्रीये ही ज्ञान प्राप्तीची कवच असली तरीही बुद्धीचे उन्नयन करून आत्मज्ञानाचीही प्रवेशद्वारे आहेत. कला ही तत्त्व आणि पार यांच्यातील संवाद साधणारा समान दुवा झाल्यामुळे हीच कला अमूर्त (प्रतीकात्मक) तरीही इंद्रियगर सांकेतिक तरीही भावोत्कट झालेली दिसते." (कुमारस्वामी : १९६९, पृ.४५)
गजेन्द्र मोक्ष, गुप्त काळ, देवगढ़, मध्य प्रदेश (स्रोत: विकिपीडिया)
गुप्तकालीन विष्णु मुर्ती :-
दैवी शक्तीचें विशेष तेज किंवा प्रभा जे वर्तुळ दाखवितात त्याला प्रभामंडळ असें ही म्हणतात. कुषाण काळापासून या वैशिष्ट्याचा उदय झाला व बुद्ध, बौधिसत्त्व, तीर्थकर वगैरेच्या प्रतिमांत प्रभामंडळ दिसू लागले. मात्र विष्णुप्रतिमेच्या क्षेत्रांत त्याचा तितकासा प्रवेश झालेला नव्हता व दाखविले तर ते अगदी साधें दाखवीत. गुप्तकालात मात्र प्रभामंडळांकडे लोकांचे जास्त लक्ष वेधले व ते आतां कधी साधे तर कधी मणिमाला, पत्रावली, हारयष्टी, मकर, कमल, वगैरे अनेक अलंकरणानीं नटलेले दिसू लागले (ल.सं.एच्. १११ चित्र ४).
नुकताच विष्णूंच्या 'उद्द्घाहू' हाताचा उल्लेख केलेला आहे. कुषाण कालांत मागील हात उद्बाहू असून सामान्य हात अनुक्रमें 'अभ्य' व 'कटि अवलंबी' असत. गुप्तकाळांत मागचे हात खाली आले व दोन्ही सामान्य हात देखील दंडांशी जवळ जवळ काटकोन करीत स्थिर झाले. साहाजिक हातांची ही स्थिती 'प्रलम्बबाहू' या नांवानें ओळखली जाऊ लागली. खाली आलेले हे विष्णूंचे हात आयुधं घेऊन तरी असतात किंवा आयुध पुरुषांच्या किंवा आयुधदेवीच्या मस्तकांवर टेकलेले असतात (रे.चि. चौदा १)
प्रतिमेंचे 'अभयान्मुख अंकन' गुप्तकाळांत फारसे रूढ राहिले नाही. मूर्तीचा दर्शनी भाग सुंदर, आकर्षक व डौलदार घडविण्यांत कलाकार आपले कसब पणांस लावू लागला, पण त्या बरोबरच पृष्ठभागांवरून त्यांने आपलें बरेचसे लक्ष काढून घेतले. तो आतां मागील भाग फक्त पुसट कल्पना येण्यांपुरताच घडवू लागला. याचा परिणाम असा झाला कीं मागच्या बाजूला फक्त प्रभामंडळाचे वाटोळेपण, दंडांची ठेवण व वस्त्राचे संकेतन शिल्लक राहिले (रे.चि. चौदा ३)
४. दागिनें :
या क्षेत्रात ही डोळ्यांत भरण्यांसारखे बदल झाले. आता दागिनें अगदी मोजके पण जास्त रेखीव दिसू लागले. विष्णूंच्या दागिन्याचा स्वतंत्र विचार पुढें क्रमानें येणारच आहे.
आयुधें :
गदा :
कुषाणगदा (रे.चि. सात १, दहा १; तेरा १,५) मुद्गलांसारखी अर्थात् खालून वर निमुळती होत जाणारी आहे. तिच्या वरच्या टोकांवर मूठ लावीत. हिची साधारण उंची पाया पासून डोक्यापर्यंत असल्यामुळे ही मलखांबासारखी दिसते. पुराणात विष्णूच्या गदेचे वर्णन 'वह्निशिखाकारा' व 'प्रदीप्त पावकोज्वला' असे केलेले आढळते. ते कुषाण गदेच्या बरेच जवळ आहे. विष्णूने गदेला सरळ किंवा उलट्या बाजूनेंही धरलेले दिसते.गुप्तकालांत गदेच्या आकारांत थोडा बदल झाला. तिची उंची कमी झाली. पण रूंदी अर्थात् पसरटपण वाढला व तिच्या बुडाशी एक बसका गोळा लावला गेला. ज्याला 'कुंभ' किंवा 'आमलक' या नांवाने ओळखतात. कुंभापासून मुठीपर्यंतच्या भागांला दंड म्हणतात. कधीं कधीं हा दंड अष्टपैलू घडवीत असत. (रे.चि. दहा २) या काळांत ही गदा विष्णूंच्या मागच्या उजव्या हातातच अनेक ठिकाणीं दिसते पण त्याबरोबर अपवाद ही आढळतात. विष्णूंच्या गदेला 'कौमोदकी' असें नांव आहे.
चक्र :
विष्णूंचे दुसरे अनिवार्य आयुध म्हणजे चक्र. ह्याचे नांव 'सुदर्शन'. बहुतेक विष्णूच्या वर उचललेल्या मागच्या डाव्या हातांत उघड्या तळहातांवर अंगठ्याच्या आधारानें चक्र पेललेले असतें च त्याची धाव उरलेल्या चार बोटांनी घरलेली दाखवितात (रे.चि. नऊ १६).
गुप्तकाळांत चक्रांचें स्थान जरी तेच असले तरी तें पहिल्यापेक्षां जास्त सुबक व वजनदार झालेले दिसते. हा वजनदारपणा दर्शविण्याकरिता क्कचित ते सरळ विष्णूच्या हातांत न देतां एका चौथऱ्यावर ठेवलेले दाखवितात व त्यावर विष्णूचा हात टेकलेला असतो.
शंख :
विष्णूचा 'पाञ्चजन्य' शंख कमरेशी टेकलेल्या त्याच्या सामान्य डाव्या हातात असतो. कुषाणकालीन बहुतेक शंख वामावर्त असून त्यावर कोणतेही अलंकरण कोरलेले दिसत नाही. शंख विष्णूच्या तळहातांवर उभा, वाकडा किंवा आडवा ठेवलेला असून कधी कधी त्याच्या पोकळींत बोटें अडकवून धरलेला असतो. (रे. चि. नऊ ९-१४) गुप्तकाळांत शंखांत फारसा बदल झालेला दिसत नाही.जलपात्र :
कुषाणकालीन काही विष्णुप्रतिमात शंखाचा पर्याय म्हणून जलपात्र दाखविलेले आहे. अशा प्रकारच्या फक्त सहा प्रतिमा आज मितिपावेतो आपणांस माहीत आहेत. (म.सं. २८.१७२९, ६४.२५२०, (चित्र.२) १५.९४८, १५.९१२, (रे.चि.तेरा १) १५ ९३३ आणि ४७ ३२५८). पाण्याचे हे भांडे मैत्रेय बोधिसत्त्वाच्या हातात दिसणाऱ्या अमृतघटांसारखें म्हणजें उंच गळ्याच्या लांबट गोल बाटलीसारखे दिसतें. ही शंख येण्यांच्या पूर्वीची स्थिती असावी. मथुरेहून मिळालेल्या एका विष्णुप्रतिमेच्या (म.सं.४७ ३२५८) जलपात्रांवर दोन्ही बाजूला अलंकरण म्हणून दोन शंखच काढलेले आहेत!! विष्णूच्या जलपात्रांचे वाङ्मयीन उल्लेख मात्र मिळत नाहीत. असें म्हणणें शक्य आहे कीं सुरुवातीला अमृतघटधारी मैत्रेयाच्या मूर्तीस डोळ्यासमोर ठेवून मथुरेच्या पाथरवटांनी विष्णूंच्या हातांत जलपात्र दिलें, पण पुढें समकालीन साहित्यिक परंपरेला प्रमुखता देऊन त्यांनी जलपात्राच्या ऐवजी शंखाची योजना केली.गुप्तकाळांत विष्णूच्या हातांत साधारणपणें घट किंवा जलपात्र दिसत नाही, अपवाद म्हणून बंगलोरच्या वस्तुसंग्रहालयांतील एका गुप्तकालीन उत्तरभारतीय मूर्तीकडे बोट दाखवितां येईल, पण तिचा स्वतंत्र विचार पुढे करू.

आयुधपुरुष :
निरनिराळ्या देवतांच्या आयुधांना स्वतंत्र देवता कल्पित करून मूर्तरूपांत दाखविण्यांची पद्धती गुप्तकाळांत रूढ झाली. मानवरूपें धारण केलेल्या आयुधांना 'आयुधपुरुष' या नांवाने ओळखतात. प्राचीन भारतीय वाङ्मयांत आयुधपुरुषांचे बरेच उल्लेख आढळतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या जन्माची कथा मिळते व अवतारांचेही वर्णन आढळतें. उदाहरणार्थ रामायणकार वाल्मीकी सांगतात की दक्ष प्रजापतीला जया व सुप्रभा नांवाच्या दोन मुली होत्या. त्यांना कृशाश्वांपासून प्रत्येकी ५०० अशी एक हजार मुलें झाली. ही अस्त्रशस्त्रांची स्वरूपें होतीं. पुढे कुशिकाचा मुलगा विश्वामित्र हा राजा झाल्यानंतर ही मंडळी त्याचेजवळ आली व योग्यवेळी ती सर्व विश्वामित्रांकडून रामाला सोपविली गेली. असें सांगताना रामायणकार लिहितात की 'ही सर्व अस्त्रे ऑजळ करून (प्राञ्जलयः) 'किंकर' रूपाने रामाचे समोर आलीं व रामानेही आपल्या हातांने त्यांना जवळ करून (पाणिना समालभ्य) आपल्यात समावून घेतले."
रामायण महाभारतांच्याच पावलांवर पुढील साहित्यकारांनी पावले टाकली आहेत. उदाहरणार्थ कालिदासानें विष्णूंच्या 'हेति' किंवा आयुधांना चेतन म्हटले आहे." दुसऱ्या ठिकाणी राजा दशरथाच्या राण्यांचे वर्णन करीत असतांना तो असें सांगतो कीं कमळ, खड्ङ्ग, गदा, धनुष्य व चक्रानें 'लांछित' ठेंगू किंवा वामन मूर्ती गर्भार राण्यांचे रक्षण करीत असत." ह्या ठेंगू मूर्ती म्हणजेच शिल्पांत दिसणारे आयुधपुरुष होत. ते आकाराने ठेंगू असून त्याचे पाठीकडे किंवा हांतात त्याचे शस्त्र रूप ओळख किंवा लांछन रूपानें असते.
शिल्पांत विष्णू, शिव, स्कंद, देवी, इत्यादि बरोबर आयुधपुरुष गुप्तकालांपासून दिसू लागतात. परंतु इतरांपेक्षा विष्णू बरोबर त्यांचे अंकन जास्त प्रमाणांत केले जातें. इतर आयुधांचा विचार योग्य ठिकाणी करू. तूर्त केवळ वैष्णव आयुधांकडे वळणें क्रमप्राप्त आहे.

सामान्यतः गदेला स्त्रीरूपांत दाखवितात व शंख व चक्र ही आयुधे ठेंगू आणि स्थूल अशा पुरुषांचे रूपांत दिसतात. काही ठिकाणी गदा शस्त्राच्या आकाराचीच असते पण तिच्या दर्शनी भागांवर स्त्रीमूर्ती कोरलेली असते. (रे.चि.सात ४, चौदा १)
जाता जाता हे नमूद करण्यास हरकत नाही की आयुधपुरुषांना क्वचित् जैनांनीही आश्रय दिला होता. राजगीर (बिहार) येथे वैभार पर्वतात मिळालेल्या तीर्थकार नेमिनाथाच्या पायशिळेंवर त्यांचे लांछन म्हणून चक्राला 'चक्रपुरुषा'च्या रूपांत अंकित केले आहे.
विष्णूंच्या आयुधांचा येथपर्यंत विचार झाला. आतां त्याच्या प्रतिमेत दिसणाऱ्या काही ठळक बाबींकडे लक्ष पुरवू. प्रथम वस्त्र व अलंकार पाहू.
अधोवस्त्र :
प्रत्येक कुषाणकालीन विष्णुशिल्पांत नेसूंचे वस्त्र म्हणून धोतर दिसतें. हे काष्टा घालून नेसलेले आहे व पुढचा सोगा जवळ जवळ पायघोळ आहे. मागील बाजूस काष्टा पुरता खोचित नसत, त्याचा थोडासा भाग बाहेर डोकावत राही. ही धोतर नेसण्यांची पद्धत त्या काळांत सर्वसामान्य होती. (चित्र १,२)
गुप्तकाळांत रुंद धोतरांबरोबरच अधोवस्त्राचा एक नवा प्रकार रूढ झालेला दिसतो. येथे वस्त्र फार लांडे गुडघ्यापर्यंतचा भाग देखील नीट झाकलेला नसतो. हे वस्त्र म्हणजे पंचावजा लांडे धोतर नसून ही 'जंधिका' किंवा 'अर्धारूक्' या नांवाने ओळखली जाणारी चड्डी असावी.
उपवस्त्र किंवा उपरणें :
कुषाण किंवा गुप्त काळांत विष्णूंच्या खांद्यावर उपकरणें हवेच असा प्रतिबंध नव्हता. पुष्कळदा तें नसतेच पण असल्यास ते खांद्यावर टाकलेले नसून कमरे भोवती गुंडाळलेले असते. त्याच्या दोन्ही पदरांची डावीकडे एक फुगीर गांठ मारून उरलेले सोगे जमीनीकडे लोंबत असतात. गुप्तकाळांत ही पद्धत थोडी बदलते कारण इतर वस्त्रांबरोबरच या काळातील उपरणें ही बारीक व तलम प्रकारचे दिसते.मुगुट व मुगुट-बंधन :
कुषाण काळांपूर्वी मोठे व शिष्ट लोक फुगीर फेटे वापरीत कुषाणकाळांत हे फेटे गेले व त्या ठिकाणीं मागे सोगा सुटलेले व बदामाच्या आकाराचा तुरा असलेले बांधीव फेटे दिसू लागले. या प्रकाराला आपण उष्णींष असे म्हणू, कुषाण विष्णूंच्या डोक्यावर अशा प्रकारचे उष्णीष दिसते (चित्र १).या कालाच्या उतरत्या दिवसांत रूढ झालेल्या दुसऱ्या प्रकारांत पुढचा तुरा व मागचा सोगा गुप्त होऊन डोक्यावरचा मुगुट उंच पण बसक्या टोपीसारखा दिसतो. कर्धी ही टोपी साधी असते तर कधीं तिच्यावर फुलांचे भरतकाम करीत व दोन्हीं कानाचे वर मोठीफुलें लावून तिच्या सुबकतेत भर टाकीत (रे.चि. सोळा ३; चित्र २)
गुप्तकाळांत वरील दोन्हीं प्रकार थोड्या फार फरकानें रूढ होते, पण त्यांना अलंकृत करण्यांच्या पद्धतीत बदल झाला. कुषाण काळातील काही मुगुटांच्या तुऱ्यावर पसरलेला जबडा असलेल्या व पुढच्या पंजात मोत्याची माळा घेतलेल्या सिंहाची आकृती दिसते (रे.चि. एक २). व्यावृत-मुख सिंहांची ही नैसर्गिक आकृती हळुहळू बदलत जाऊन तिचे ठिकाणर्णी 'मुक्तादाम' ओकणारे सिंहमुख किंवा तशाच प्रकारचे कीर्तिमुख दिसू लागते (रे. चि. पंधरा ४). या शिवाय पूर्ण विकसित कमळे, एकाधिक कीर्तिमुखें, चौफुल्या, मगराची तोंडे, वगैरे अनेक अलंकरणाचा उपयोग मूर्तिकाराने आपापल्या आवडीप्रमाणें केलेला दिसतो. (रे.चि. ४)
मुगुटाच्या वरच्या बसक्या भागांवर देखील एक अधोमुख कमल काढण्यांची पद्धत या काळांत सुरू झाली होती. (चित्र ४ या प्रतिमेच्या मुगुटांवर असें कमळ आहे.)
जानवें :
कुषाण काळांत जानव्याचा उपयोग सर्रास नव्हता. आजपर्यंत मिळालेल्या फक्त पांच विष्णु-प्रतिमांत (म.सं.१५.९५६, ३४.२४८७ (चित्र १) ३९.२८५८,४९.३५०२ व ५०.३५५०) तें दिसते. याचा आकार साध्या दोऱ्याचा आहे.गुप्तकाळांत मात्र जानव्याचा वापर वाढला; पण त्या बरोबरच त्याचे साधे रूप ही लुप्त होऊन मोत्याच्या सरांने तयार केलेला तो एक अलंकार झाला. मोत्यांचे जानवें किंवा 'मुक्तायज्ञोपवीत' याला जणू की काय एका दागिन्यांचे रूप आले (चित्र ४, रे.चि. चौदा१).
कटिसूत्र : (रे.चि.तेरा ४,५)
प्राचीन भारतांत धोतरांवरून कमरेभोवती गुंडाळलेली एक अरुंदपट्टी शिष्टसम्मत पोषाखाचें एक आवश्यक अंग मानले जात असे. पाली साहित्यांत या पट्टीला 'कायबंधन' असें म्हटले आहे व विनयपिटकांत तिचे प्रकार ही सांगितले आहेतः कुषाणकालीन विष्णुप्रक्षतमांत कायबंधनांचा उपयोग केलेला दिसतो. यापुढे पट्टीचे स्थान गोंडेदार बारीक दोरी घेते. हेंच 'कटिसूत्र' किंवा आपला कडदोरा अथवा करगोटा होय.अंगद, कंकणें आणि कुण्डलें :
या दागिन्यांचा वापर कुषाण काळांपासूनच रूढ झाला व पुढेही चालू होता. विष्णूची 'मकरकुण्डले' अजून शिल्प परंपरेंत उगवली नव्हती; पण मणी, चक्र, पुष्प व क्वचित सिंहकुंडलाचाही उपयोग केलेला दिसतो (म.स. ३४.२५२५, ल.सं. एच्. १११, बंगलोरचा धनवंतरि).दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक)

टपोऱ्या मोत्यांचा किंवा मण्यांचा एकच सर किंवा एकावली गुप्तकाळांतील आवडता दागिना होता. यातील मधला मणी सगळ्यांत मोठा असून आजुबाजूचे क्रमाने लहान आकाराचे दिसतात. कधी या दागिन्याला एकाऐवजी एकाच खोडांत पटवलेले दोन पदर असतात (ल.सं.एच्. ११०, एच्. १११).
गुप्तकाळांतील विष्णूचा दुसरा दागिना म्हणजे मोत्यांचे किंवा मण्यांचे एकाधिक पदर एकत्र गुंफून तयार केलेला 'हारयष्टी' नांवाचा जाडजूड दागिना! यांत रत्नांचाही वापर करीत असावेत
वनमाला :
विष्णूंच्या 'वनमाली' या नांवांवरून त्याचे वनमालेशी किती जवळचें नातें होते हे दिसतें. वन्यपुष्पांची माळा ती वनमाला असा या शब्दाचा सोपा अर्थ आहे. कुषाण काळांत ती तशीच तयार करीत. तिचे पहिले व जास्त लोकप्रिय रूप म्हणजे कदंब, कमळ, वगैरे फुलें, इतर पार्ने व कळ्या ओवून तयार केलेली आखुड माळा (म.सं.२९.२००२, २८.१७२९, ४९.३५०२ रे. चि. सतरा ४). दुसरें रूप ही आकारानें लहानच असते. पण त्यांत फुलांचा भरणा जास्त असून घोसांसाठी पानांचा व मोठाल्या फुलांचा उपयोग केलेला आढळतो (म.सं. १५.९५६). तिसरा प्रकार म्हणजे गुडघ्यांपर्यंत रूळणारी लांब वनमाला. ही पद्धत गुप्तकाळांत फारच लोकप्रिय झाली. आता वनमालेचे जुनें नैसर्गिक रूप जाऊन तिने फुलांचा दाट हार किंवा गजऱ्याचे गोंडस रूप घेतले व ती विष्णूच्या कंठाच्या बाजूंनी प्रगट होऊन दोन्हीं दंडावरून वळसे घेत गुडघ्यांपर्यंत रूळू लागली (चित्र ४, रे. चि. सतरा ८).
वाङ्मयीन परंपरेंत आढळणारी विष्णूंची ही दोन्ही चिन्हे कुषाणकालीन मूर्तीत क्वचित अपवाद वगळल्यास दिसत नाहीत. श्रीवत्साचा कुषाणकाळांत बराच वापर होता पण शिल्प परंपरेंत विष्णूंशी त्याचा संबंध स्थिर झालेला नव्हता. 'श्रीवत्स' हे एक नैसर्गिक चिन्ह होते अथवा गळ्यांतील दागिन्याचे ते एक विशिष्ट आकारांचे पदक होते हे निश्चित सांगता येत नाही. हरिवंशकारांच्या मतांप्रमाणें वक्षस्थलांवरील रोमांनी निर्मित झालेली ती एक नैसर्गिक आकृती होती. या उलट काही प्रतिमांत ते कंठाभूषणांच्या पदकांप्रमाणेंच वापरलेलें दिसते. (उदयगिरी, विदिशा येथील विष्णु; रा. सं. नवी दिल्ली येथील गुप्तकालीन विष्णु) सरासरी गुप्तकाळांपर्यंत विष्णुशिल्पांत श्रीवत्साचा अनिवार्य असा उपयोग झालेला दिसत नाही. महाभारतांप्रमाणें श्रीवत्स हे मूलतः 'त्रिशूल चिह्न' असून विष्णूने शंकराच्या मैत्रीस्तव ते हृदयांवर धारण केले होते.
विष्णु-शिल्पांचे वर्गीकरण
अभ्यासाच्या दृष्टीने वैखानसगमानें"' केलेले विष्णुशिल्पांचे वर्गीकरण बरेच सोयीचे आहे. ते असें -वैष्णव ध्रुवबेर (अचलमूर्ती)
स्थानक
आसन
शयन
(उभी)
(बसलेली)
(आडवी किंवा निजलेली)
प्रत्येकांचे ४ प्रकार
- योग (उदा. योगस्थानक)
- भोग (उदा. भोगासन)
- वीर (उदा. वीरशयन)
- आभिचारिक (उदा. अभिचारिक स्थानक)
मुळांत वैखानसागम हा दक्षिणभारतांत तयार झालेला असून तो गुप्तोत्तर कालांतील असावा, पण त्यांत वर्णन केलेल्या परंपरेचे आधार मात्र जुनें असले पाहिजेत.
वरील वर्गीकरणांत उल्लेशिलेल्या तिन्हीं प्रकारच्या प्रतिमा मिळतात. पण खालील उपप्रकारांत आभिचारिक स्थानक, अभिचारिक आसन व आभिचारिक शयन प्रकारांच्या मूर्ती सहसा आढळत नाहीत.

स्थानक मूर्ती :
इतर प्रकारांपेक्षा उभ्या अर्थात् स्थानक मूर्तीची संख्या जास्त आहे. आपणांस आजपर्यंत माहीत असलेल्या स्थानक प्रतिमा खालील प्रकाराच्या आहेत.
१) चतुर्भुज
२) द्विभुज
३) अष्टभुज
४) चतुर्व्यह
५)पञ्चवीर
६) वैकुंठ
७) विश्वरूप
८) अनंत
९) हरिहर
१०) काही अवतार मूर्ती
शयनमूती :
या वर्गाची फक्त एकच प्रकारची प्रतिमा म्हणजे शेषावर झोपलेला विष्णू आपणांस आढळतो.आतां या सर्व उपप्रकारांची किंचित विस्तारांने पाहणी करू.
चतुर्भुज स्थानक मूर्ती : (चित्रे १,३,४)
आयुधांची पकड, दागिन्यांचा व वस्त्रांचा किंचित बदल, प्रभामंडळाची स्थिती, वगैरे बारीक तपशिलात न शिरल्यास या वर्गाच्या प्रतिमा साधारणपणें एकाच प्रकाराच्या आहेत. कुषाण काळांतील मूर्ती 'उद्बाहू' आहेत (रे.चि. दहा १). गुप्तकाळांत त्या 'प्रलंबबाहू' होतात (रे. चि. दहा २). गदा, चक्र व शंख या आयुधांची स्थानें बहवंशी निश्चित आहेत व अजून आयुधांपुरुषांना वगळल्यास इतर परिवार देवतांची ही गर्दी झालेली दिसत नाही.द्विभुज स्थानक मूर्ती : (र.चि. पंधरा १)
द्विभुज विष्णूमूर्तीची संख्या फारच मोजकी आहे." या प्रकारचे उल्लेखनीय शिल्प म्हणजे ग्वाल्हेर संग्रहालयांत असलेली व विदिशेहून हाती आलेली उभयोन्मुख विष्णूची प्रतिमा. येथें जवळ जवळ एकाच प्रकारच्या दोन प्रतिमा पाठीशी पाठ लावून घडविलेल्या आहेत. श्री गर्दे यांनी हिला सूर्यप्रतिमा म्हटले आहे, पण हा महत्त्वपूर्ण असा दोन हातांचा विष्णू आहे. कारण -१) इ. सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकांपासूनच विदिशा हे वैष्णवाचे एक केंद्र होते पण सौरांचा तेथें संबंध असावा असें वाटत नाही. येथें कमीतकमी दोन विष्णू मंदिरे व गरुडध्वज तरी नक्कीच होते. ग्रीकांसारख्या बाहेरच्या लोकांचाही येथील वैष्णवांशी संबंध होता.
२) वस्त्रांची पद्धत, भावभंगिमा, मुगुटांबाहेर अलगद डोकावणारे बारीक केस, दागिन्यांची ठेवण वर उचलेला उजवा व कमरेवर ठेवलेला डावा हात वगैरे बाबतीत ही प्रतिमा मथुरेच्या कुषाणकालीन विष्णूमूर्तीशी फार जवळ आहे.
३) वाङ्मयांत द्विभुज विष्णूंचे उल्लेख मिळतात.
४) येथें सूर्याचे कोणतेही लक्षण यथा पायांतील जोडे, सुरा किंवा कमळ, रथ वगैरे दिसत नाही. शिवाय या मूर्तीच्या कालांपर्यंत (अर्थात् इ.स.च्या पहिल्या दोन शतकांत) सूर्य प्रतिमेचे इतके जास्त भारतीयकरण झालेले नव्हते.
अष्टभुज स्थानक मूर्ती : (चित्र ५)
चतुर्व्यह विष्णू : (चित्र ६, रे. चि. सोळा३)
पञ्चवीर : (चित्र ७)
वैकुण्ठ : (र. चि. चौदा १,४) :-
विश्वरूप : (चित्र ८)
अनंत :
हरिहर :-


विष्णूच्या विभव किंवा अवतार प्रतिमा :
पृथ्वीवर वेळोवळीं उत्पन्न झालेल्या अवांछनीय तत्त्वांचा संहार करून धर्मसंस्थापनेचे कार्य संपादन करण्यांकरिता महाविष्णू निरनिराळे अवतार घेतो असा सिद्धांत भगवद्गीतेंत स्पष्टपणें मांडला आहे, पण त्या पूर्वी ही अवतार वाद अस्तित्वांत नव्हताच असें मात्र म्हणता येत नाही. साधारणपणें असें प्रतिपादन करण्यात येतें की अवताराची कल्पना गुप्तकाळात रूढ झाली, पण हा सिद्धांत निर्विवाद रूपानें ग्राह्य झाला आहे असें नाही. एक मत असें ही मांडण्यांत येते कीं अवतार नावांनी प्रसिद्ध असलेल्या वराह संकर्षणादि देवता गुप्तकाळांपूर्वी अस्तित्वात होत्या, पण वैष्णव अवतारांच्या साखळीत मात्र त्यांना स्थान मागहून मिळाले.सर्वसाधारणपणे विष्णूचे दहा अवतार आहेत असे मानले जाते. यामध्ये प्रामुख्याने मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे आहेत. परंतु ही संख्या एवढीच सीमित नाही. तर ती वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये कमी-जास्त होताना आढळते. ही संख्या १०, १५, २०, २२ नाही तर सात्वत संहितेमध्ये ३९ अवतारांची नावे आढळतात.यामध्ये गौतम बुद्धांचाही समावेश केल्याचा दिसतो. प्रचलित दशावतारांपैकी पहिले पाच अवतार हे विष्णूचे दैवी दर्शवितात. पुढील अन्य अवतार हे मानवी अवतार आहेत.विष्णूंच्या अवतारांच्या नावां व संख्येबद्दल बराच वाद आहे. उदाहरणार्थ काही याद्या पहा.
|
ग्रंथ |
अवतारांची नांवे |
एकूण संख्या |
|
वाल्मीकीय रामायण (युद्ध. ११७.१२-३१) |
एकशृंग वराह, कृष्ण, राम परशुराम, त्रिविक्रम |
५ |
|
महाभारत (शांति., ३३९.१०३-४) |
हंस, कूर्म, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन परशुराम, राम, कृष्ण (सात्वत), कल्की |
१० |
|
मत्स्यपुराण (४७.२३४-५०) |
यज्ञ, नृसिंह, वामन, दत्तात्रेय, मांधाता जामदग्न्य, राम, वेदव्यास, बुद्ध, कल्की |
१० |
|
अग्निपुराण (४९.१-९) |
मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, राम (बल), बुद्ध, कल्की |
१० |
|
वायुपुराण (९८.७१-११७) |
यज्ञ, नरसिंह, वामन (उपेंद्र), दत्त, मान्धाता, जामदग्न्य, राम, वेदव्यास, कृष्ण, कल्की |
१० |
|
ब्रह्मपुराण (२१३.१-४३; २१३.७६-१६८) |
वराह, नृसिंह, वामन, दत्त, जामदग्न्य, राम, कृष्ण, कल्की |
८ |
|
पद्मपुराण (पंचम खंडात अवताराचे विस्तृत वर्णन आहे) |
मत्स्य (अध्या. २३०), कूर्म (अ.२३१-३२) वराह (अध्या. २३७), नृसिंह (अ.२३८) वामन
(अध्या. २३९), परशुराम (अ.२४१) |
१० |
|
स्कंदपुराण, वैष्णवखंड वासुदेव माहात्म्य (१८.१६-४५) |
वराह कपिल कृष्ण मत्स्य दत्त व्यास कूर्म
ऋषभ
बुद्ध |
१४ |
|
विष्णुपुराण (तीन.१.३६-४४) |
यज्ञ हरि अजित मानस वामन सत्य वैकुंठ |
७ |
|
विष्णुधर्मोत्तर पुराण (तीन अ.८५) |
नृसिंह पद्मनाभ मोहिनी वराह वामन पृथु कपिल कूर्म भार्गवराम विश्वरूप हंस दाशरथीराम हयग्रीव मत्स्य वाल्मीकी दत्तात्रेय |
१६ |
वाल्मीकीय रामायण एकशृंग वराह, कृष्ण, राम
(युद्ध. ११७.१२-३१) परशुराम, त्रिविक्रम ५
महाभारत हंस, कूर्म, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन
(शांति., ३३९.१०३-४) परशुराम, राम, कृष्ण (सात्वत), कल्की १०
मत्स्यपुराण यज्ञ, नृसिंह, वामन, दत्तात्रेय, मांधाता
(४७.२३४-५०) जामदग्न्य, राम, वेदव्यास, बुद्ध, कल्की १०
अग्निपुराण मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम,
(४९.१-९) राम, राम (बल), बुद्ध, कल्की १०
वायुपुराण यज्ञ, नरसिंह, वामन (उपेंद्र), दत्त,
(९८.७१-११७) मान्धाता, जामदग्न्य, राम, वेदव्यास,
कृष्ण, कल्की १०
ब्रह्मपुराण वराह, नृसिंह, वामन, दत्त, जामदग्न्य,
(२१३.१-४३; २१३.७६-१६८) राम, कृष्ण, कल्की ८
पद्मपुराण (पंचम खंडात मत्स्य (अध्या. २३०), कूर्म (अ.२३१-३२) १०
अवताराचे विस्तृत वर्णन आहे) वराह (अध्या. २३७), नृसिंह (अ.२३८)
वामन (अध्या. २३९), परशुराम (अ.२४१)
राम (अध्या. २४२-२४४), कृष्ण (अ.२४५-५२)
कल्की (अध्या. २५२.२१), बुद्ध (अ.२५२.१९-२०)
स्कंदपुराण, वैष्णवखंड वराह कपिल कृष्ण
वासुदेव माहात्म्य (१८.१६-४५) मत्स्य दत्त व्यास १४
कूर्म ऋषभ बुद्ध
नृसिंह राम (परशु) कल्की
वामन राम (दाशरथी)
विष्णुपुराण (तीन.१.३६-४४) यज्ञ हरि
अजित मानस वामन ७
सत्य वैकुंठ
विष्णुधर्मोत्तर पुराण (तीन अ.८५) नृसिंह पद्मनाभ मोहिनी
वराह वामन पृथु
कपिल कूर्म भार्गवराम १६
विश्वरूप हंस दाशरथीराम
हयग्रीव मत्स्य वाल्मीकी
दत्तात्रेय
वृद्धहारित स्मृती १०
अहिर्बुध्न्यसंहिता ३९
अभिलाषितार्थ चिंतामणि ७
या काही निवडक याद्या देण्यांचा हेतु एवढेच दाखविणें आहे कीं विष्णूच्या अवतारांची दहा ही संख्या बरीच लोकप्रिय असली तरी ती सर्वनुमतें ग्राह्य नव्हती व तपशिलांत ही बरेच फरक होते असें जरी असले तरी सर्वसाधारण भर दोन जलचर (मत्स्य व कूर्म), दोन वनचर (वराह व नरसिंह), दोन ब्राह्मण (वामन व परशुराम), दोन क्षत्रिय (राम, कृष्ण) असे आठ व बुद्ध आणि पुढे होणारा कल्की असे एकूण दहा अवतार मानण्यांकडे होता.
वरील दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म व कल्की याच्या स्वतंत्र प्रतिमा किंवा मंदिरें गुप्त कालांपर्यंत अस्तित्वांत असावी असे वाटत नाहीं. बुद्धाची मूर्ती कुषाण काळांत घडविली गेली व तिचे पूजन ही चालू झाले, पण ते फक्त बौद्ध धर्मांचे अंग म्हणून, ब्राह्मण धमौत नव्हे, ही स्थिती गुप्त काळांपर्यंत होती. पुढें बुद्धाला ब्राह्मण-मूर्तिशास्त्रांत स्थान मिळाले पण त्या बरोबरच वृद्धहारीतस्मृती सारख्यांनी त्यांच्या पूजनांबद्दल निषेधाज्ञा लावून ठेवली, हीच गोष्ट जैन तीर्थकर ऋषभ यालाही लागू होते. भागवतकारांनी ऋषभालाही अवतारात धरले आहे, पण ब्राह्मणधर्मीय वाङ्मयांत त्याच्या प्रतिमें अगर पूजेबद्दल उल्लेख मिळत नाहीत.
अवतारांसंबंधी दुसरी एक गोष्ट लक्षांत ठेवावयांस हवी कीं जरी बरेचसे अवतार अपूज्य नव्हते तरी त्यांच्या स्वतंत्र मूर्ती घडविण्यांचा सर्व साधारण प्रघात नव्हता. या वर्गात कपिल, वाल्मीकी, अजित, मानस, सत्य वगैरे अप्रसिद्ध अवतार मोडतात.
या शिवाय प्रत्येक काळांत दहा अवतार ही समान रूपानें स्वीकार्य होते असें नाही. उदाहरणार्थ अष्टभुज विष्णू हा कुषाण व गुप्त काळांत मान्य होता पुढे तो मावळला. या उलट मुरलीधर कृष्ण, व कोदंडपाणि राम गुप्त काळांपर्यंत दिसतच नाहीत.
एवढ्या प्रस्तावाने नंतर प्रत्यक्ष अवतार मूर्तीकडे वळू.
कूर्मावतार :-
वराह :
वराहाचे उल्लेख ऋग्वेद, तैत्तिरीय संहिता, कपिष्थल कथा संहिता, शतपथ ब्राह्मण, वायुपुराण यासारख्या ग्रंथात आढळतात. वराहावताराची कथा हरिवंशात येते. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी बुडवली तेव्हा विष्णूने वराहाचा अवतार घेतला, हिरण्याक्षाचे दमन केले आणि पृथ्वीला बाहेर काढले.१) वराह आलीढ मुद्रेत उभा असून द्विभुज किंवा चतुर्भुज आहे.
२) याच्या डोक्यावर मुगुट नसून हातांतही पुष्कळदा कोणतेही वैष्णव आयुध दिसत नाही. अपवाद म्हणून नचनाकुठारा येथील वराहाचे हातांत चक्र व शंख आहेत.
३) आपादलम्बिनी वनमाला त्याच्या गळ्यात आहे.
५) वर आणलेली पृथ्वी बहुतेक वराहाच्या सुळ्यावर लोंबलेली असते. पण उदयगिरी येथे ती एका कमळावर दाखविली आहे. दुसऱ्या गटाच्या वराहमूर्तीत तो आपल्या मूळ रूपांत अर्थात् पशुरूपांत दाखविला आहे. याला 'यज्ञ वराह' असें नांव असून याचा अभिप्राय वराहाचे संपूर्ण शरीर यज्ञमय होय हे सुचविणे आहे. या प्रकाराची एरण येथील मूर्ती विशेष उल्लेखनीय आहे तिच्या देहांवर वल्कले नेसलेले व कमण्डलु घेतलेले ऋषि असून इतर देवही कोरलेले आहेत. वराहाच्या गळ्यांत असलेल्या माळेवर राशी कोरलेल्या दिसतात. या प्रकारच्या अंकनपद्धतीने पुराणात वराहासाठी वापरलेल्या अनेक शब्दाचा बोध करविण्यांचा प्रयत्न केलेला दिसतो. तशा प्रकारचे काही ठळक शब्द म्हणजे 'वेदवेदाङ्तनु", वेदमयशरीर", रोमान्तरस्थमुनिगण", पशुजानुमरवाकृति' वगैरे होत.
मत्स्यपुराणांत नृ-वराहाला 'महावराह' असे ही नांव दिले आहे", अग्निपुराणकार यालाच 'भूवराह' म्हणतात व याच्या स्थापनेचे फल राज्य प्राप्ती होय असें सांगतात.
नृवराह :
पाकिस्तानच्या पुरातत्त्व विभागांत असलेला सुमारे ५-६ व्या शतकांतील नृवराह वेगळ्या प्रकारचा आहे. हा बांडासाहेबखेल, बन्नू, उत्तर पश्चिमप्रांत येथे उत्खननांत मिळाला. या शिल्पाची वैशिष्ठ्यें खालीलप्रमाणे आहेत :-सापाच्या पोटावर आलीढ मुद्रेत उभा, तोंडावर दाढी, चेहरा वराहाचा पण कान माणसाचे, पोषाख सॅसेनियन पद्धतीचा, डोकीवर बसकी टोपी, भालपट्ट, लांब झगा, उजव्या हातांत चक्र, उपबाहूत शेषाची शेपटी, डावा मांडीवर, दुसऱ्यात शंख, डाव्या कोपरावर बसलेली पृथ्वी, पायाखाली सात फणा असलेला मान वळवून वर पहाणारा पण उताणा पडलेला शेष, वगैरे.
- वराहाची एकूण घडण सॅसेनियन पद्धतीची असली तरी पृथ्वीच्या अंकनावर मात्र तशी छाप दिसत नाही (रे.चि.वि.४)
Farid Khan, Recent discoveries from North-West Frointiers Pakistan, SAS 8, 1972 figs. 2,3,4 pp. 67-69
नरसिंह:
या अवताराचा समावेश विष्णूच्या अवतारांमध्ये कसा झाला असावा याबद्दल स्पष्टता नाही. तैत्तिरीय आरण्यक, महानारायण उपनिषद यामध्ये सिंहरूपी देवाचे वर्णन आढळते. अवतारकथा विष्णू पुराणात अगदी थोडक्यात तर हरिवंशात थोडी विस्ताराने येते. प्रचलित आणि रूढ असलेली प्रल्हादाची कथा भागवत पुराणात आढळते. हजार वर्षे तप करून हिरण्यकशिपु या दैत्यांच्या सम्राटाने ब्रह्मदेवाची उपासना करून त्याला प्रसन्न केले आणि मृत्यू न येण्याचा एक विचित्र वर मागितला. ज्यामध्ये देव, दानव किंवा प्राणी, हात किंवा शस्त्र, दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर आणि जमिनीवर किंवा हवेत त्याला मरण येणार नाही अशा अटी होत्या. या अटींच्या यादीत मनुष्य नाही. या सगळ्या अटी कोणताही मनुष्य पूर्णच करू शकणार नाही याची त्याला खात्री होती. याचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त झाला. त्याला मारायचा पुष्कळ प्रयत्न हिरण्यकशिपुने केला. परंतु प्रत्येक वेळेला श्रीविष्णूने त्याला वाचवले. एक दिवस हिरण्यकशिपुने त्याला विचारले की, जर तुझा सगळीकडे आहे तर तो या खांबातही आहे का? त्यावर त्या बालकाने हो असे उत्तर हिरण्यकशिपुने चिडून त्या खांबाला लाथ मारली. त्यामुळे तो खांब दुभंगला आणि त्यातून अधां आणि अर्धा पुरुष असा अवतार प्रकटला. हिरण्यकशिपु आणि त्याच्या सैन्याने नृसिंहावर चढवला. तुंबळ युद्ध झाले. देवाने सर्व दानवांना मारले. शेवटी संध्याकाळी, घराच्या उंबऱ्यावा त्याला मांडीवर घेऊन नखांनी त्याचे पोट फोडले. अशा तन्हेने हिरण्यकशिपुने मागितलेल्या करा सर्व अटींची पूर्तता करून नृसिंहाने त्याचा वध केला. मंदिरांमध्ये खांबातून प्रकट होणारा, हिरण्यकशिपुबरोबर लढणारा, एकटा नृसिंह किंवा लक्ष्मी नृसिंह अशी नृसिंहांची शिल्पे आढळतात. स्वतःच्या मांडीवर घेऊन हिरण्यकशिपुचे पोट फाडणारा असे त्याचे सर्वात प्रचलित शिल्प आहे. वाकाटक काळातील नृसिंहाचे दोन मंदिरे रामटेक वे टेकडीवरील राम मंदिराशेजारी आहेत. ज्यामध्ये बसलेल्या नृसिंहाची उत्कृष्ट शिल्पे आहेत.गुप्त काळांतील नरसिंहाच्या सुमारे दहा " प्रतिमा आपणांस माहीत आहेत (उदा. चित्र ११) पैकी बऱ्याच खंडित आहेत. त्यामुळे त्यांची सर्व सामान्य लक्षणे सांगणे कठिण आहे. एवढे मात्र म्हणता येईल की वराहांप्रमाणें नृसिंहाच्या देखील मानवपरिमाण मूर्ती घडवीत असत. डोक्यावर मुगुट नसे, फक्त वनमाला व जरूरीप्रमाणें आयुधं दाखवीत.
केवल नरसिंह :
मोधादक (ताडीकोंडमंडल, गुन्तूर) येथून हाती आलेला (तूर्त स्थानीय संग्रहालय, अमरावती) नरसिंह उजव्या हातांत चक्र घेऊन व डावा मांडीवर ठेऊन राजलीला सनांत बसला आहे. दक्षिण भारतांतील हा प्राचीनतम नरसिंह असावा. (रे.चि.वि.५)I.K. Sarma, Early Bhuvaraha and Narasiniha Images from Elal Govindrai Pet, Ranga Reddi, A.P., IAH, 1990 Pl. 1A, pp. 549-56
विष्णू बैठकीवर चक्रपुरुष :
पाल कलेचा एक स्थानक विष्णू (तूर्त राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली) वर, शंख, पद्म आणि चक्र घेतलेल्या या विष्णू प्रतिमेच्या बैठकीच्या दर्शनी भागावर एका वर्तुळांत डावीकडे कललेला दहा हाताचा चक्रपुरुष सुखासनांत बसलेला आहे. दोन हात डोक्यावर जुळले आहेत, इतर हातांत बाण, खड्ग, घंटा, धनुष्य, ढाल ही आयुधं आणि वर अभय (वितर्क) या मुद्रा दिसतात (रे.चि.वि.६)R.C. Agrawala, Unpublished Sculptures and Terracottas in the National Museum, New Delhi, Some Allied Problems, EW., 17, Figs. 17, 18. p. 280
वामन व त्रिविक्रम :
तीन पावलात विश्व व्यापून टाकणाऱ्या वामन- त्रिविक्रमाचा उल्लेख ऋग्वेदात अनेक ठिकाणी आढळतो. शतपथ ब्राह्मण या ग्रंथात त्याची कथा थोडी विस्ताराने दिसते. पुढे तैतिरीय संहिता, रामायण आणि अनेक पुराणात ही कथा येते. दैत्यराज बळीने तिन्ही लोक व्यापून असुरांचे राज्य स्थापन केले. त्या वेळेस भगवान विष्णू वामनाचे म्हणजे एका छोट्या बटूचे रूप घेऊन बळीने आरंभिलेल्या यज्ञात गेले. यज्ञात त्यांनी दान मागितले. तेव्हा बळीने दान म्हणून तो छोटा वामन त्याच्या तीन पावलात जेवढी जागा व्यापेल तेवढी त्याने देवांना देण्याचे मान्य केले. यावर विष्णूने आपले विराट रूप प्रकट केले. पहिल्या पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्याप्त करून टाकला. आता तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारल्यावर बळीने आपले मस्तक पुढे केले. तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात लोटून दिले. याची दोन शिल्पे प्रचलित आहेत. एका शिल्पात छत्रीधारी बटू रूपातील विष्णू असतो. अन्य शिल्पात एक पाय जमिनीवर आणि दुसरा आकाशाकडे उचलेल्या पुरुषरूपी विष्णूचे शिल्प असते. अशा शिल्पात उचललेल्या पायाखाली काही छोटी शिल्पे असतात. ज्यामध्ये दान देण्यासाठी झारीतून पाणी सोडताना बळी दिसतो तर त्याच्या पाठीशी दैत्यांचे गुरू शुक्राचार्य उभे असतात. वामनाची मंदिरे आढळतात. खजुराहोमध्ये वामन मंदिर आहे ज्यात गर्भगृहात वामनमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.गुप्तकाळात मात्र बटु वामन व त्रिविक्रम अशी दोन्ही रूपें दिसू लागली. किंबहुना त्रिविक्रमांचे पायाखाली दान देणारा राजा बळी व त्याच्यापुढे छत्र घेतलेला बटु अंकित करावा असें मत्स्यपुराणानें विधान केले आहे", ह्या बटु वामनाला स्वतंत्र रूपानेही अंकित करीत. तशा स्वरूपांत हा आखुड मांड्याचा असून थोडा ढेंबरपोट्या व ठेंगू असतो. हात दोनच असतात - एकांत माळा व दुसऱ्यांत पाण्याचा गड्डू दिसतो. डोक्यांवर मागे सारलेले केस असतात व ब्रह्मचाऱ्याचे चिह्न म्हणून खांद्यावर जानवें असून त्यातील हरणांचे डोकें ठळकपणें छातीवर दिसते. अलाहाबाद संग्रहालयांतील डोंगरांवर उभा असलेला बटु (रे. चि. अठरा१) व भारत कला भवन, वाराणसीच्या अभिलिखित स्तंभांवरील वामन ही होत. (भा.क.भं.सं. २२५).
१) त्रिविक्रमांचे आठ हात त्यांच्या वाढत्या बळाचे प्रातिनिध्य करतात.
२) त्याचे रूप विश्वव्यापी असल्यामुळे सूर्य चंद्र त्याच्या बाजूला आले आहेत.
३) ऋक्षराज जांबवान त्याची प्रदक्षिणा करीत आहे.
४) त्रिविक्रमांबरोबरच बळीचा यज्ञमंडप, दान घेणारा वामन वगैरेही कोरले आहेत.
५) त्रिविक्रमांच्या पाठीकडे कमलधारिणी लक्ष्मी उभी आहे.
६) पदमपवाया प्रतिमेचा उजवा भाग तुटलेला आहे, पण नेपाळ व मधुरेच्या मूर्तीच्या मदतीनें कल्पना करतां येते कीं त्या कडेला विष्णूनें वर उचलेला डावा पाय असावा. कालिदास या पायाला 'तिर्यगायामशोभिपादः' असें म्हणतो
७) ह्या वर उचललेल्या पायाचे पाऊल एका राक्षसी तोंडाला जाऊन भिडते हे तोंड विष्णुधर्मोत्तरपुराणांच्या मतें 'बटबटीत डोळ्याच्या एका देवाचे आहे. ८' वराहपुराण याला फुटणाऱ्या ब्रह्मांडांचे प्रतीक मानतें, " महाभारत व कुर्मपुराण (ब्रह्म) अंडाचे कपाल असे म्हणतात व श्री. बॅनर्जी याला राहू असें मानतात. या सर्व मतांत त्या तोंडाला 'ब्रह्मांड कपाल' असें मानणें युक्तिसंगत आहे.
८) त्रिविक्रमांच्या उजव्या पायाला जवळ जवळ मिठी मारलेला एक पुरुष दिसतो. हा राजा बळी असावा.
वैखानसागमांत त्रिविक्रमाच्या ध्यानांचे विस्तृत वर्णन आहे. त्यांत सूर्य-चंद्रादि परिवार देवता, ढोलकें वाजविणारा जांबवान, राजा बळी व राणी विंध्यावली, नमूचि, वगैरे दैत्य, गंवा इत्यादि अनेकांची गणना केलेली आहे. यापैकीं बऱ्याच गोष्टी वरील मूर्तीत दिसतात, उत्तरेपेक्षा दक्षिणेंतील मूर्ती वैखानसागमाला साहजिकच जास्त जवळच्या आहेत.
वामनाची कथा :-
वामनावताराची पुराणांतली कथा ही मूळ वैदिक रुपक कथेचे ऐतिहासिक अलंकारिक रुपांतर आहे. पुराणांतली कथा सर्वांस परिचित आहे. तेंव्हा ही कथा मूळची ऋग्वेदांतली पहिल्या मंडलातली २२ व्या व १५४ व्या सूक्तांमधील ऋचेंवरून घेतली आहे, ज्यात तो सूर्य अर्थात विष्णु ह्या तीन गोष्टींना आपल्या तीन पाऊलांत व्यापतो. ज्यात ही तीन पाऊले म्हणजे दिवसाचे तीन सकाळ, सायंकाळ व रात्र असे तीन भाग किंवा विश्वाचे पृथ्वी, आकाश व पाताळ असे तीन भाग ह्या अर्थाने आहे. ही सूर्यकिकरणांनी व्यापिलेल्या ह्या तीन भागांची रुपक कथा ऋग्वेदामध्ये आहे. ह्या तीन पाऊलांत तो सूर्य अर्थात विष्णु सर्व विश्व व्यापितो. ते मूळ पाच मंत्र पाहुयांत.अतो॑ दे॒वा अ॑वंतु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे । पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः ॥१६॥
इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दं । समू॑ळ्हमस्य पांसु॒रे ॥१७॥
त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः । अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् ॥१८॥
विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥१९॥
तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यंति सू॒रयः॑ । दि॒वी॑व॒ चक्षु॒रात॑तं ॥२०॥
तद्विप्रा॑सो विप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते ।विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दं ॥२१॥
ह्या पाचही मंत्रांचा अर्थ सायण नावाच्या भाष्यकारानुसार सांगायचा तर विष्णूने अर्थात सूर्याने ह्या संसारास तीन पाऊलांनी व्यापिलं आहे. इथे सायणाचार्यांचे भाष्य आपण अभ्यासले तर इथे अकारण वामनावताराची मनगढन्त कल्पना केली आहे. वेदांमध्ये कोणत्याही अवताराची कथा नाहीये. पण पुराणांमध्ये ती आलीय. आता १५४ वं पूर्ण सूक्त पाहुयांत.
विष्णो॒र्नु कं॑ वी॒र्या॑णि॒ प्र वो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजां॑सि ।
यो अस्क॑भाय॒दुत्त॑रं स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यः ॥१॥
प्र तद्विष्णुः॑ स्तवते वी॒र्ये॑ण मृ॒गो न भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः ।
यस्यो॒रुषु॑ त्रि॒षु वि॒क्रम॑णेष्वधिक्षि॒यंति॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥२॥
प्र विष्ण॑वे शू॒षमे॑तु॒ मन्म॑ गिरि॒क्षित॑ उरुगा॒याय॒ वृष्णे॑ ।
य इ॒दं दी॒र्घं प्रय॑तं स॒धस्थ॒मेको॑ विम॒मे त्रि॒भिरित्प॒देभिः॑ ॥३॥
यस्य॒ त्री पू॒र्णा मधु॑ना प॒दान्यक्षी॑यमाणा स्व॒धया॒ मदं॑ति ।
य उ॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वीमु॒त द्यामेको॑ दा॒धार॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥४॥
तद॑स्य प्रि॒यम॒भि पाथो॑ अश्यां॒ नरो॒ यत्र॑ देव॒यवो॒ मदं॑ति ।
उ॒रु॒क्र॒मस्य॒ स हि बंधु॑रि॒त्था विष्णोः॑ प॒दे प॑र॒मे मध्व॒ उत्सः॑ ॥५॥
ता वां॒ वास्तू॑न्युश्मसि॒ गम॑ध्यै॒ यत्र॒ गावो॒ भूरि॑शृंगा अ॒यासः॑ ।
अत्राह॒ तदु॑रुगा॒यस्य॒ वृष्णः॑ पर॒मं प॒दमव॑ भाति॒ भूरि॑ ॥६॥
ह्या सूक्ताचा संक्षेपांत अर्थ पहायचा म्हटला तर मी त्या विष्णूचे अर्थात सूर्याचे वर्णन करतो ज्याने तीन पाऊलांत समग्र विश्व व्यापिले आहे व आकाशांस स्थिर केले आहे. ज्याने पृथ्वी, द्युलोक व समस्त भूवनांस धारण करून ठेवलेलं आहे, ज्याने निर्माण केलेल्या औषधी, अन्नादिंनी मनुष्याचे पोषण होते, त्यांस मी वंदन करतो.
इथे विष्णु म्हणजे दुसरे कुणीही नसून तो सूर्य ह्या अर्थाने आहे. सूर्य तीन पाऊलांनी तीन भूवने व्यापितो ह्याचाच अर्थ विष्णूची तीन पाऊले आहेत.
आश्चर्य म्हणा किंवा शोकांतिका म्हणा, ह्या संपूर्ण मंत्रांमध्येच काय पण चारीही वेदांमध्ये कुठेही बलीचा साधा किंवा पुसटसा उल्लेखही नाहीये. नाही म्हणजे ना आणि ही. तरीही पुराणांनी ही मनगढन्त कथा का रचली व त्यासाठी व्यासांचा नावाचा बळी अकारण का दिला हेच कळत नाहीये. ऋग्वेदांतले आणखी काही मंत्र जिथे जिथे ह्या तीन पाऊलांच्या विष्णु म्हणजे सूर्याच्या तीन पाऊलांच्या कथेचा वामनावताराशी वरवरपाहता अर्थ प्रतिध्वनित होतोय असा भ्रम होतो. ऋग्वेद १.११५.४,६.४९.१३,७.१००.४८.१२.२७ ह्या सर्वांत व अन्यत्र "उरुगाय", " विचक्रमे", उरुक्रम:, मिमान:, रजसो विमान:, पार्थिवानि विममे आदि मंत्रांमध्ये देखील हेच विष्णुच्या त्रिपाद विक्रमाचे संदर्भ आहेत. अन्य तीन वेदांतले मंत्रही ह्याच प्रकारचे असून तिथेही विष्णुच्या अर्थात सूर्याच्या किंवा परमेश्वराच्या त्रिपाद विक्रमाचे वर्णन आहे.
आता भाष्यकारांचे अर्थ पाहुयांत.
स्कंदस्वामी नावाचे ऋग्वेदांवरचे सर्वात प्रथम भाष्यकार ह्याचा मुख्यत: इतिहासपरक व गौणत: सूर्यपरक असा दोन्ही अर्थ करतात. इतिहासपरक अर्थ करताना ते सप्तधाम अर्थात पृथ्वीचे सात द्वीप असा अर्थ करतात. १.२७.२० ह्या मंत्राचा अर्थ प्रकट करताना स्कंदस्वामी सूर्यपरक अर्थ करतात व त्यात विष्णु हा सूर्य असून जो प्रत्यही विक्रमण करतो व उदय, मध्यान्ह व अस्त ही त्याची तीन पाऊले आहेत असा रुपक अर्थ प्रकट करतात. ते तीन लोकांची आणखी कल्पना करताना अग्नीरुप पृथ्वीस, विद्युतरुप अंतरिक्षांस व सूर्यरुप द्युलोकांस व्यापतो असे रुपक करतात. यजुर्वेदभाष्यकार उव्वट व महीधर हे वामनावतारच मानतात.
वेंकटमाधव हे भाष्यकार ह्या मंत्रांचा अध्यात्मपरक व सूर्यपरक अर्थ करतात. त्यांच्या मते विष्णु हे परमपद यज्ञ असून सप्तछंद हे सप्त धाम आहेत, मनुष्यांच्या कर्मांचे बंधन हे ह्या विष्णूचे खरे कर्म आहे. सूर्यपरक अर्थामध्ये ते विष्णूंस इंद्राचा नियोज्य सखा व आकाशांत पसरलेले तेज हे परमपद असा अर्थ घेतात.
मुद्गल नावाचे भाष्यकार ह्याचा अध्यात्मपरक अर्थ करताना ईश्वरांस जगताचा पालक, रक्षक सांगतात. व त्रेधा ह्या शब्दांवरून ईश्वर हा कर्ता, धर्ता व संहर्ता रुपांत आहे हे सांगतात. गायत्र्यादि सात छंद हे सप्तधाम आहेत असा अर्थ ते करतात.
जिज्ञासूंनी ह्या तीन्ही भाष्यकारांचे भाष्य निम्नलिखित संकेतस्थलांवरून संग्राह्य करून प्राप्त करावे. करावे. https://archive.org/details/RigVeda31 इथे ते प्राप्त होईल.
वेदमहर्षी श्रीमत्स्वामी दयानंदांचा अर्थ :-वेदांवरचे षड्वेदांगाना अनुकूल असे आजपर्यंतचे सर्वोत्तम भाष्यकार व वेदादिधर्मशास्त्राविषयीच्या अनेक भ्रांतींचे निवारण करणारे वेदोद्धारक ऋषिश्रेष्ठ, ज्यांची पुण्यतिथी कालच अमावस्येंस झाली, ते आपल्या ऋग्वेद भाष्यामध्ये उपरोक्त मंत्रांचा अर्थ अध्यात्मिक करतात व विष्णुंस संसारांत व्याप्त असण्याने निराकार परमेश्वराचे द्योतक मानतात. ते "त्रेधा निदधे पदम्" ह्या व "विष्णुुपद" ह्याचा संबंध सृष्टीरचनेच्या संदर्भात लावताना परमेश्वर आपल्या पायांनी अर्थात प्रकृती, परमाणु आदि सामर्थ्याच्या अंशाने सर्व जगांस तीन स्थानांमध्ये धारण करतो असा व्यापक अर्थ करतात.
निरुक्तकार यास्कांचा अर्थ :-
षड्वेदांगापैकी एक प्रमुख अशा निरुक्तामध्ये विष्णुपद ह्या विषयांवर यास्कमूनीसुद्धा परमेश्वराने सृष्टी बनविताना तीन प्रकारची रचना दाखवितात असा अध्यात्मपरक अर्थच केला आहे.
वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकर सुद्धा ह्या मंत्रांचा परमात्मपरक अर्थच लावताना परमात्मा सप्तधामांमध्ये अर्थात पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, तन्मात्रा, महत्तत्व ह्या सात तत्वांत व्याप्त होऊन पराक्रम दर्शवितो असा अर्थ प्रकट करतात. सात्विक, राजस व तामस ह्या तीन भेदांनी क्रमश: द्युलोक, अंतरिक्ष व भूलोक हे तीन पाद अर्थात पाय आहेत असा अर्थ करतात.
जयदेव शर्मा विद्यालंकार ह्यांनी देखील परमात्मपरक अर्थच केला आहे. जास्ती कशाला अहो परकीय अशा पाश्चात्य भाष्यकार मैक्सम्युलर, मैक्डौनेल, कीथ, ग्रिफीथ हे देखील विष्णूंस सूर्य मानूनच अर्थ प्रकट करताना आपल्याला दिसतात.
मग हे वामनाचे स्वरुप आले कुठून???
तर तैत्तिरीय संहितेमधून २.१.३१ येथून. ह्यानंतरच सर्व परवर्ती भाष्यकारांनी ह्याचा अर्थ अकारण वामनावताराची जोडला आहे. अर्थात पुराणांनी अकारण बळीला मध्येच घुसडले आहे जे ह्या आधीच्या उपरोक्त ग्रंथांत कुठेही उल्लेखिलेले नाहीये. वेदांवरचे व्याख्यानरुपी असे ब्राह्मणग्रंथांतील वर्णन शतपथ ब्राह्मण ह्या ग्रंथामध्ये ह्याचा अर्थही विस्ताराने वर्णिताना विशुद्ध असा यज्ञपरक केला असून विष्णु हे यज्ञाचे स्वरुप असून यज्ञीय देवता असाही केला आहे. "वामनो हि विष्णुरास:" असे १.२.५.५ येथे शतपथामध्ये म्हटले आहे. "यो वै विष्णु: स यज्ञ:" (५.२.३.६) येथे व "विष्णुर्वैयज्ञ:" असे ऐतरेय, तांड्य, तैत्तिरीय ब्राह्मण व गोपथ ब्राह्मणामध्येही म्हटलेलं आहे.
निरुक्तामध्ये विष्णु शब्दाचा अर्थ पदार्थांमध्ये व्याप्त व प्रविष्ट गुण अशा अर्थाने आहे. त्याची व्युत्पत्ती निम्नलिखित आहे.
विष्लृ- व्याप्तौ, विश-प्रवेशने, वि पूर्वक अशूङ्-व्याप्तौ धातु पासून हा विष्णु शब्द सिद्ध होतो. निरुक्तावर भाष्यकरताना दुर्गाचार्य, ज्याचे "निरुक्ताचे मराठी भाषांतर" नावाने भाषांतर इतिहासाचार्य राजवाड्यांचे बंधु वैजनाथ काशिनाथ राजवाड्यांनी केलंय, जे पीडीएफ उपलब्धही आहे, त्यातही सूर्य हाच अर्थ दुर्गाचार्य करतात. भगवद्दत्त रिसर्च स्कौलर व शिवनारायण शास्त्री हे निरुक्तभाष्यकारही हाच अर्थ घेतात.
शौनकाच्या बृहद्देवतेमध्ये सूर्याच्या नावांची व्युत्पत्ती सांगताना
विष्णातेर्विशतेर्वा स्याद् वेवेष्टेर्व्याप्तिकर्मण: !
विष्णुर्निरुच्यते सूर्य: सर्वं सर्वान्तरश्च य: ! २.६९
अर्थ - विष्णु हा शब्द व्यापणारा ह्या अर्थाने विष्णूची त्या सूर्यस्वरुपांत व्याख्या केलीय जो सर्व काही व सर्वव्याप्त आहे.
उपनिषदांमध्येही व्यापक परमात्मा असा अध्यात्मपरकच अर्थ आहे. काठक संहिता ३/९, मैत्रायणी ६.२६, ६.१६, ७.७, तैत्तिरीय १.१.१ येथेही हेच वर्णन आहे. म्हणजे उपनिषदे देखील हाच व्यापक अर्थ प्रकट करतात.
आता लौकिक साहित्यातला अवतारपरक अर्थ कुठे कुठे आहे ते पाहुयांत. रामायणामध्ये, महाभारतामध्ये तीन वेळा, पुराणांमध्ये तर अतिरंजित असा आहे. अर्थातच तो प्रक्षेप आहे हे सिद्ध आहे.
ह्या सर्वांच्या विवेचनाचा निष्कर्ष काय????
ऋग्वेदामध्ये कुठेही विष्णुसाठी वामन शब्दाचा प्रयोग नाहीये व बळीचे नावही नाहीये ! आम्ही वरही सांगितलंय की बली हा शब्दही चारी वेदांच्या संहितांमध्ये नाही म्हणजे नाहीच.
वैदिक साहित्यापासून पौराणिक साहित्यापर्यंत ह्या आख्यानाचे अर्थ किती बदललेले आहेत व उत्तरोत्तर ते किती विकृत होत गेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच वैदिक मंत्रावरून जे तसा अवतारपरक व ऐतिहासिक अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात ते सर्व लोक चूकीच्या दिशेवर आहेत हे सांगण्यांस कोणताही प्रत्यवाय नाहीये.
वामन हे नाव व त्याच्या रुपाची प्रेरणा व कल्पना तैत्तिरीय संहिता व ब्राह्मणग्रंथ, जे वेदांवरची व्याख्यानरुपी ग्रंथ आहेत हे आम्ही अनेकवेळा सांगत आलोय, त्या ब्राह्मणग्रंथांमध्येदेखील हे सर्व वर्णन केवळ आख्यानस्वरुपाने आलंय. कारण ब्राह्मणग्रंथांची शैली ही मूळातच आख्यानात्मक व रुपकात्मक आहे. व ती अलंकारिक आहे. त्यामुळे त्यामध्ये ह्या वर्णनांत ऐतिहासिक पक्ष सिद्ध होत नाहीच नाही. आमच्या आधीच्या आचार्य शंकराचार्यांच्या लेखातही आम्ही वेदांमध्ये नित्यपक्ष सिद्ध केला आहे.
आर्याक्रमण सिद्धांत सप्रमाण खोडणार्या एका मुख्यमंत्र्यांच्या ग्रंथांचा संदर्भ
डॉ. संपूर्णानंद हे नाव अनेकांनी ऐकलं असेल. ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. अतिशय विद्वान मनुष्य ! त्यांनी यह आर्योंका आदि देश है
नावाने जो ग्रंथ लिहिलाय, त्यात पृष्ठ क्रमांक २०३ वर वैदिक आख्यान मांडताना ह्या कथेवर भाष्य करताना "सूर्य का पहिय्या व विष्णु के तीन पाद" ह्या शीर्षकाखाली ही पूर्ण वेदांतली कथा कशी रुपक कथा आहे व पुराणांनी अकारण त्याचे कसे ऐतिहासिक रुपांतर करून विपर्यांस केलाय हे सविस्तर लिहिलं आहे. तो ग्रंथ पीडीएफ उपलब्धही आहे. जिज्ञासूंनी तो वाचावा ही विनंती.
अंतिम निष्कर्ष :-
पूर्वोक्त आख्यान हे दोन स्वरुपांत आपणांस पाहता येईल.
१. प्रकृतीपरक अर्थात सूर्याच्या स्वरुपांत
२. रुपक अलंकांरिक अर्थात परमात्मस्वरुपामध्ये
१. ह्यात प्रकृतीपरक अर्थ घेणार्यांमध्ये निम्नलिखित भाष्यकार आणखी सांगता येतील.
अधिकांश भारतीय तथा पाश्चात्य भाष्यकार जसे यास्कमूनी, शाकपूणि, और्णवाभ, मेधातिथी, शौनक, स्कंदस्वामी, वेेंकटमाधव, लोकमान्य टिळक, मैक्सम्युलर, मैक्डोनल, कीथ, ग्रिफीथ, बेर्गेन, !
डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण त्यांच्या "इंडियन फिलॉसॉफी"ह्या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये ४९५ पृष्ठांवर सूर्यच अर्थ घेतात. डॉ. बलदेव उपाध्याय त्यांच्या "वैदिक साहित्य और संस्कृती" ह्या ग्रंथामध्येही सूर्यच अर्थ घेतात. डॉ. एस एन दासगुप्ता देखील आदित्य असाच अर्थ घेतात (दि हिस्टरी एफ इंडियन फिलॉसौफी भाग द्वितीय, पृष्ठ ५३५). डॉ. रामचंद्र मजुमदार हे नामवंत इतिहासकारही सूर्याचेच प्रतीक असा अर्थ घेतात.
२. अध्यात्मपरक अर्थात परमात्मवाचक अर्थामध्ये महर्षि दयानंद, मुद्गल, जयदेव शर्मा विद्यालंकार, सातवळेकर, महर्षी अरविंदसुद्धा.
मग आता पुराणांमधल्या वामनावताराच्या कथेचं काय???
तर ही कथा रुपक अर्थाने आहे हे स्पष्ट होत असून त्यात झालेली अत्युक्ती ही त्याज्य असून जरी ती स्वीकारायची म्हटली तरी ती ऐतिहासिक अर्थाने न घेता अध्यात्मपरक व रुपक अर्थाने घ्यावी हीच विनंती !
तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते
गुण अवगुण निवाडा, म्हैस म्हैस रेडा रेडा !
हा तो निवाड्याचा ठाव, खर्या खोट्या निवडी भाव !
अंगे उणे त्याचे बसे टाळक्यांत, काय करु म्हणे आम्ही धक्का खवंदासि लागतसे !
जगद्गुरु तुकोबाराय
अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !
हयग्रीवः
घोड्याचे तोंड असलेला हा विष्णूंचाच एक अवतार आहे. आतां जरी हा फारसा प्रसिद्ध नसला तरी महाभारतांप्रमाणे विष्णु, वामन, अग्नी, स्कंद, वगैरे पुराण ग्रंथात आणि लौगाक्षि सारख्या स्मृतिग्रंथांतदेखील 'हयग्रीव', 'हयशीर्ष' किंवा 'अश्वशिर' या नावांने या अवताराचे वर्णन मिळतें. या अवताराची कथा व त्याचे कार्य याबद्दल तो अप्रसिद्ध असल्यामुळें थोडक्यात माहिती देतो.जग 'एकार्णव' स्थितीत किंवा प्रलयावस्थेत असतांना 'मधु' आणि 'कैटभ' नांवाच्या दोन दैत्यांनी ब्रह्मदेवाच्या नजरेंसमोरच चारही वेदांचे हरण केले. वेद परत मिळविण्यांसाठी ब्रह्मदेवानें विष्णूंची प्रार्थना केली व विष्णूने अश्वमुख मानवाचे रूप घेऊन सामगायनांस प्रारंभ केला. गाण्यांचे सूर कानी पडतांच दोघेही हातचे वेद टाकून स्वरांच्या दिशेने धावू लागले. वेळ साधून हयग्रीवाने ते वेद हस्तगत केले व ब्रह्मदेवाला दिले. पाञ्चाल देशाच्या गालव नामक ऋषीनें हयग्रीवाची आराधना करून त्याकडून वेदांचा 'क्रम' मिळवला. 'वेदमात्रार्थतत्वज्ञ' होण्यांकरितां हयग्रीवाचा प्रसाद आवश्यक होय असें स्मृतिकारांचे म्हणणे आहे.
मूर्तिशास्त्रांत हयग्रीवांचे अंकन कुषाण काळांपासूनच सुरु झाले होते. भारतकलाभवन, वाराणसी येथे संग्रहित असलेल्या (भा.क.भ.सं.४८४६ चित्र १३) मथुरेहून मिळालेल्या हयग्रीवाच्या चतुर्भुज प्रतिमेंस घोड्यांचे तोंड असून मागील हातांत गदा व चक्र अशी आयुधे आहेत. तो मांडी घालून बसला आहे व त्याचा उजवा हात पोटावर असून
डाव्यातील लांबट वस्तू मात्र नीट ओळखतां येत नाही. (रे.चि. तेरा ३) गुप्तकाळातील हयग्रीवाच्या मूर्ती मोजक्याच आहेत. त्यापैकीं एक मथुरेत असून (म.सं.सं. ३६.२६६४) दुसरी तेथूनच मिळालेली असली तरी आज पश्चिम बर्लिन येथे आहे. ही विष्णू-नरसिंह वराह-हयग्रीवाची सर्वतोभद्र मूर्ती महत्त्वाची आहे. येथें हयग्रीवाचा अभयमुद्रेत उजवा हात खांद्यापर्यंत उचलेला असून डाव्यांत वेदांची पोथी दिसत आहे. बाकी दोन हात प्रलंबावस्थेत असून आयुधपुरुषांच्या डोक्यावर ठेवलेले आहेत. विशेष म्हणजे गदा देवी उजवीकडे नसून डावीकडे आहे.
मधुकैटभारि :
विष्णूनें हयग्रीवरूपांत मधुकैटभांपासून वेद परत मिळविले पण त्या दैत्यांचा वध केला नाही. त्यांसाठी 'मधुकैटभारि' या नांवाने दुसरा अवतार झाला. ही कथा हरिवंशांत मिळते. ब्रह्मदेवानें मातीचे दोन महाअसुर केले. दुसऱ्या पर्यायाप्रमाणें विष्णूच्या कानापासून त्यांचा जन्म झाला. यातील एक 'मऊ' व दुसरा 'कडक' वाटल्यामुळे ब्रह्मदेवाने पहिल्यास 'मधु' व दुसऱ्यास 'कैटभ' असे नांव दिले. पुढें हे असुर वरदर्पित झाले, ब्रह्मदेवाला पळ काढावा लागला व शेवटी विष्णूनें त्या दोघांना आपल्या हातांने चिरडून टाकले. दोघांचे देह पुनः एक झालें, जल लहरीनी घुसळले गेल्यामुळे त्याच्यातून मेद वाहू लागला व पृथ्वीला 'मेदिनी' अशी संज्ञा प्राप्त झाली. याशिवाय महाभारताच्या सभा, वन आणि शांतिपर्वात" मधुकैटभाची कथा आढळते पण तपशिलांत थोडा फरक आहे. विष्णूनेच मातीच्या या दोघा असुरांना प्रथम अनेक वर दिले व नंतर युद्धांत त्यांना आकाशाखाली आपल्या उघड्या मांडीवर दडपून दोघांची डोकी चक्राने कापली.मधुकैटभवधाचे अंकन करणारे दृश्य गुप्त कलेंत क्वचित आढळते. भीतरगाव येथील इष्टिका मंदिरावर एक फलकांत या दोघां असुरांना दोन हातांनी धरून मांडीवर चिरडणाऱ्या विष्णूची प्रतिमा आहे (चित्र१४).
हरि अथवा करिवरद :
आपल्या नित्यपाठांत असलेल्या 'पञ्चरत्नी' गीतेंत एक रत्न म्हणून गजेन्द्रमोक्षाची कथा दिलेली असते. गजेन्द्र नांवाच्या एका हत्तीचा पाय पाण्यांत असलेल्या एका मगरानें धरला व हत्तीस आपल्याकडे ओढू लागला. संकटात सापडलेल्या गजेंद्राने विष्णूचा धावा केला व जवळचे कमळ उपटून ते विष्णूस समर्पण करण्याकरिता त्याने सोंड वर केली. विष्णू गजेंद्राच्या हांकेस ओ देऊन गरुडावर बसून धावून आला व त्याने आपल्या चक्राने मगराचा वध करून हत्तीस सोडविले.धनवन्तरि :
बंगलोर येथील शासकीय संग्रहालयांत उत्तर भारतात मिळालेली भुरकट रंगाच्या रेताळ दगडाची गुप्तकालीन विष्णु प्रतिमा आहे. हिच्या सामान्य उजव्या हातात घट असून मागच्या उजव्यांत चक्र, मागच्या डाव्यात गदा व सामान्य तळहातांवर आडवा ठेवलेला शंख आहे. अर्थात् प्रलम्बबाहू असलेल्या या प्रतिमेचा आयुधक्रम इतरांपेक्षा अगदी वेगळा आहे. या शिवाय विष्णूच्या कानातील सिंहकुंडले, आपादलम्बिनी वनमाला, गुडघ्यापर्यंत लोंबणारे जानवें वगैरे गुप्तकालाच्या दृष्टीने उल्लेखनीय गोष्टी आहेत.मानवी अवतार :-
परशुराम :
दशावतारांत सहावा अवतार म्हणून परशुरामाची गणना करतात. ऋषी जमदग्नी व राजकन्या रेणुकेपासून ब्राह्मणवंशात झालेला हा मुलगा धनुर्वेद व परशु चालविण्यांत निष्णात असून क्षत्रियांचा शत्रू होता. दक्षिण भारताशी याचा बराच संबंध होता, विशेष करून कोंकणपट्टी यानेच बसविली असे मानतात. तेथे आजही भार्गवरामांचे स्थान आहे.उत्तरभारतांत परशुरामाच्या स्वतंत्र पूजेचा फारसा प्रघात नाही व त्यामुळे दशावतार मालिकेत जरी याचे दर्शन घडत असले तरी स्वतंत्र प्रतिमा, अगदी मोजक्या आहेत. यादृष्टीने ग्वाल्हेर जवळ मिळालेली गुप्तकालीन प्रतिमा फारच महत्त्वाची आहे. येथे परिपुष्ट शरीराचा द्विभुज परशुराम उजवा हात कमरेवर ठेवून उभा आहे. त्याचा डावा हात जमिनीवर टेकलेल्या विशाल परशूवर विसावलेला दिसत आहे. ब्राह्मणाला आवश्यक जटा वगैरे लक्षणें येथें नाहीत.
बृहत्संहिता परशुराम प्रतिमेचा उल्लेख करीत नाही. मात्र विष्णुधर्मोत्तरपुराणाच्या मते द्विभुज भार्गवरामाच्या हातांत परशु असावयास पाहिजे.
राम :
रामकथेच्या प्राचीनतेबद्दल संदेह नसला तरी रामोपासना सुद्धा तितकीच प्राचीन असेल असे मात्र सांगता येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे असें कीं रामकथादृश्यें असलेली कोणती ही गुप्तकाळापूर्वीची कलाकृती अजून तरी आपणांस माहित नाही. स्वतंत्र अशी रामाची मूर्ती तर गुप्तकालांत देखील मिळत नाही. मात्र ती घडविण्याविषयी उल्लेख बृहत्संहिता व विष्णुधर्मोत्तरपुराण या दोन्ही ग्रंथात आढळतात. या काळातील खाली नोंदलेली रामकथा दृश्यें महत्त्वाची आहेत :१) देवगढ येथें अहिल्योद्वारा, वन गमन अत्रीच्या आश्रमांत रामाचे येणें, शूर्पणखेंची दुर्गती, दंडकवनांत राम, सीताहरण, राममारूती, वालिसुग्रीव युद्ध, किष्किंधेत लक्ष्मण, अशोकवनांत सीता, मृतसंजीवनीचा शोध, वगैरे अनेक प्रसंग चित्रित होते.
२) भारतकला भवन वाराणसी येथे तेथूनच मिळालेल्या एका शिळापट्टावर सेतुबंधाचे दृश्य आहे.
३) येथेंच काही मृफलकांवर राम नावेतून नदी ओलांडतांना दाखविला आहे.
४) जुन्या श्रृंगवेरपुरांतून मिळालेल्या एका शिळापट्टांवर वानरांसह राम, लक्ष्मण उभे दिसतात."
५) मध्यप्रदेशाच्या नचना गांवातून मिळालेल्या मृफलकांवर राम, लक्ष्मण, सीता आणि शूर्पणखा, सुग्रीवास अभयदान, सीता व रावण इत्यादी कथादृश्यें अंकित आहेत. "
६) श्रावस्तीत मिळालेल्या व तूर्त लखनऊ संग्रहालयात असलेल्या एका मृफलकांवर सुग्रीव व विरूपाक्षाचे युद्ध दर्शनीय आहे.
७) बिहारमध्ये चौसा व अफसाद या गावांतून बरेचसे रामकथा-मृदफलक मिळाले आहेत."
८) वानरांसह राम लक्ष्मण अंकित करणारा पटना संग्रहालय येथील मृफलक.
९) झझ्झर (हरियाणा) येथील अभिलिखित मृझलक.
यावरून हें स्पष्ट दिसते की मंदिरांच्या किंवा घरांच्या भिंतीवर रामकथेची दृश्यें अंकित करावयाची पद्धत बरीच जुनी होती. भासाच्या 'प्रतिमा' नाटकांत तिचे अस्तित्व पहावयास मिळतेच.
शिल्प रामायण
![]() |
| सर्व देवांनी भगवान विष्णूचा धावा केला |
भगवान विष्णू यांनी सर्व देवांना सांगितले की ते राजा दशरथाच्या घरी जन्म घेतील आणि रावणाचा वध करतील.
![]() |
| विश्वामित्र राजा दशरथाकडे यज्ञाची रक्षा करण्यासाठी विनंती करताना |
![]() |
| विश्वामित्र, राम व लक्ष्मण |
![]() |
| राम व ताडका युद्ध |
![]() |
| सूबाहू वध |
![]() |
| राज जनक, विश्वामित्र, राम व लक्ष्मण |
![]() |
| प्रत्यंचा चडवित असताना राम व समोर सीता |
![]() |
| रामाचा राज्याभिषेक |
![]() |
| राम सीता लक्ष्मण |
![]() |
| शुर्पणखेचे नाक कापताना लक्ष्मण |
![]() |
| सुवर्ण मृग |
![]() |
| मारीच वध |
![]() |
| रावण सीतेचे हरण करताना |
![]() |
| रावण आणि त्याच्या पायाशी जटायू |
![]() |
| राम हनुमान भेट |
![]() |
| सातही वृक्षांना एकाच बाणात छेदताना |
रामाच्या शक्तीवर त्याचा विश्वास नसल्याने तो रामाला ताडाचे सात झाड एका बाणात पडायला सांगतो. राम जेंव्हा ते सातही वृक्ष पाडतात तेंव्हा सुग्रीवाला विश्वास बसतो आणि तो बालीला युद्धासाठी पुकारतो.
![]() |
| सुग्रीवचा राज्याभिषेक |
पुढे सुग्रीव बाली युद्धात राम बालीचा वध करतात आणि सुग्रीवाला किष्किंधा नगरीचा राजा बनवितात. राम स्वतः सुग्रीवाचा राज्याभिषेक करतात आणि अंगदाला युवराज घोषित करतात.
![]() |
| श्रीराम हनुमानाला अंगठी देताना |
![]() | |
| सीता आणि हनुमान भेट |
![]() | |
| दशानन रावणासमोर हनुमान |
![]() |
![]() |
| पहिल्या रकान्यात अंगद व रावण |
![]() |
| मधल्या रकान्यात कुंभकर्णाला झोपेतून जागे करताना |
रावण आपल्या सैन्याला आदेश देतो की कुंभकर्णाला झोपेतून जागे करा. रावणाच्या आज्ञेने कुंभकर्ण युद्धात उतरतो आणि हाहाकार माजवतो.
![]() |
| दशानन रावण |
![]() |
| रथावर आरूढ श्रीराम |
![]() |
| रावणाचा वध |
कृष्ण :
विष्णूचा हा आठवा अवतार सर्वात श्रेष्ठ अर्थात् पूर्णावतार म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णांचा जन्म मथुरेंत झाला, त्याने गोकुळांत बालक्रीडा केली व किशोरावस्थेतच मथुरेचा राजा कंस याला मारून फार मोठा पराक्रम गाजवला. यामुळे साहजिकच व्रजक्षेत्र अर्थात् मथुरेच्या जवळपासचे भाग कृष्णोपासनेचे माहेरघर मानले गेले.आजपर्यंत हाती असलेल्या माहिती प्रमाणें श्रीकृष्णांचे प्रथम अंकन भारतीय ग्रीक राजा अगॅथोल्कियस सुमारे (१८०-६५ इ.पू.) याच्या ऐखनूम येथून मिळालेल्या सहा ब्रोंझच्या नाण्यावर दिसते. या नाण्यांवर ब्राह्मी व ग्रीक भाषेत राजाचे नाव असून एका बाजूला श्रीकृष्ण व दुसऱ्या बाजूला बलरामाची मूर्ती आहे. दोघेही योद्धांच्या वेषांत आहेत. त्याच्या डोक्यावर छत्रे असून पायांत जोडे, खांद्यावर उपरणी, कानांत कुंडले आणि मस्तकावर मुगुट आहेत. कृष्णाजवळ चक्र व शंख आहे तर बलरामाचे हातांत गदा व मुसळ दिसते. बलरामाचे हातांत गदा व मुसळ दिसते. दोघांच्याही कमरेस तलवारी लटकत आहेत."'
कुषाणकाळांपासून कदाचित त्यापूर्वीपासूनच, कृष्णलीलेची दृश्यें दगडांवर कोरण्यांची पद्धत व्रजक्षेत्र व त्या परिसरांत विद्यमान होती. लहानग्या कृष्णांस डोक्यावर घेऊन वसुदेवाचे यमुना ओलांडणे (म.सं. १७.१३४४), घोड्याच्या रुपानें आलेल्या केशी दैत्याशी कृष्णाची लगट (म.सं. ५८.४४७६), गोवर्धन धारण (राजस्थानांतून मिळालेले मृझलक)" बलराम कृष्ण व त्यांची एकानंशा या प्रतिमा (रे. चि. पंधरा ६) अशी कित्येक दृश्यें आज आपणांस माहित आहेत. असे जरी असले तरी या काळांत श्रीकृष्णांच्या स्वतंत्र प्रतिमा नसाव्यात असे मानण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. ही विचारसरणी तर्कशुद्ध नाही. थोडक्यात तिची साधकबाधक चर्चा करू.
आज साधारणपणे कृष्णाची प्रतिमा म्हणजे रांगत्या बाळकृष्णांची किंवा तिरका पाय ठेवून वेणू वाजविणाऱ्या मुरलीधराची प्रतिमा अशी सांगड आपण बांधलेली आहे. पण ही दोन्ही रूपें व कृष्णाची 'मधुरा' भक्ती मध्यकाळांत झालेल्या उत्तर व दक्षिण भारतांतील संतांनी आपणांस दिली, प्रेमळ भक्तांनी ती उचलून धरली व तेव्हांपासून अनेक कर्वांनी शाहिरांनी, चित्रकारांनी आणि गवैयांनी ती अमर केली. मग ही रूपें कुषाणकाळांत आपणांस कशी मिळणार? त्यावेळच्या स्थितीचे आकलन करण्यांकरिता आपणांस जुन्या वाङ्मयांची बाडेंच धुंडाळली पाहिजेत.
या संबंधांत मुख्य प्रश्न असा कीं महाकाव्यें व पुराणांस अपेक्षित असलेला कृष्ण चतुर्भुज होता किंवा द्विभुज ? हा प्रश्न भगवद्गीतेची टीका लिहीत असतांना रामानुजाचार्यांच्यासमोर सुद्धा उभा राहिला होता. त्याचे त्यांनी व विष्णुपुरांणांचा टीकाकार विष्णुचित्त यांने जे निराकरण सुचविले ते आपल्या दृष्टीनें महत्त्वाचे आहे. दोघांचाही मथितार्थ असा की कृष्णाचे मूळरूप 'परमार्थतः' चतुर्भजच होय. वसुदेव-देवकी यांच्या प्रार्थनेंमुळे कृष्णाने कंसवधापर्यंत आपल्या दोन हातांना गुप्त ठेवले होते इतकेच, अर्थात् त्याचे मनुष्य रूप द्विभूज व मुख्य रूप चतुर्भुज. ही गोष्ट महाभारत, विष्णू, मत्स्य, लिंग, ब्रह्म, पद्म, वगैरे पुराणग्रंथाची छाननी केल्यास ही स्पष्ट होते. शंख, चक्र, गदा, किंवा शंख, चक्र, गदा व धनुष्य अथवा तलवार घेतलेल्या चतुर्भुज कृष्णांचे कित्येक उल्लेख आपणांस आढळतात. गुप्तकाळांपर्यंत कृष्णांच्या मूळ रूपांस अर्थात् परमार्थिक रूपांस म्हणजेच चतुर्भुज रूपांस जास्त मान्यता होती हे मानावे लागेल याप्रमाणे संगती लावल्यास मथुरेहून मिळणाऱ्या व शंख-चक्र-गदा धारण करणाऱ्या विष्णुमूर्तीतच वासुदेव कृष्णाला शोधले पाहिजे.
वरील निष्कर्ष सुदैवानें प्रत्यक्ष प्रमाणांने देखील सिद्ध होतो तो असा. काही वर्षांपूर्वी मथुरा संग्रहालयासाठी एक कुषाणकालीन शिलापट्ट विकत घेतला (म.सं.सं. ६७.५२९ रे. चि. पंधरा ६) त्यांत एका स्त्रीमूर्तीच्या आजुबाजूस दोन चतुर्भुज मूर्ति कोरलेल्या आहेत. त्यापैकी डावीकडून प्रथम प्रतिमेच्या कानांत एकच कुंडल असून मागील हातात गदा व सिंहलांगल आहे. स्त्रीमूर्तीच्या उजवी कडील प्रतिमा गदा व चक्र घेतलेली अर्थात विष्णूंची आहे. एक कुंडल व सिंहलांगल यामुळे बलराम सहज ओळखतां येतो बलराम व वासुदेव विष्णू अर्थात् कृष्ण यांच्यामधील स्त्रीमूर्ती एकानंशेची असली पाहिजे हे लक्षण ग्रंथांवरून सहज ताडता येते. एकानंशा ही कृष्ण व बलराम यांची बहीण होती. या त्रिवर्गाच्या प्रतिमेला पुरेसे वाङ्मयीन आधार आहेत. अशा प्रकारच्या इतरही कृषाणकालीन प्रतिमा मथुरा संग्रहालयांत आहेत. वासुदेव विष्णू किंवा कृष्णाला चतुर्भुज दाखवीत असत हे या मूर्ती सहज सुचवतात. (उदाहरणार्थ रे. चि. तेरा १, यांत जवळची एकानंशा दाखविलेली नाही.) वीणकार की
जैन शास्त्रांप्रमाणे तीर्थकर नेमिनाथाचे पार्श्वचर म्हणून यदुवंशातील बलदेव व वासुदेव किंवा नारायण यांना दाखवितात. कुषाणकालीन नेमिनाथाच्या कित्येक प्रतिमांतही वासुदेव गदा चक्र घेतलेला चतुर्भुजच दाखविला आहे.
चतुर्भुज वासुदेव किंवा कृष्णाचे अंकन गुप्तकाळातही चालत असे. गढवा येथून मिळालेल्या भीम-जरासंध युद्धांच्या एक दृश्यांत (ल.सं.एच् ८८) भारतीय कथेप्रमाणे दर्शक म्हणून अर्जुन व कृष्ण उपस्थित आहेत. येथे कृष्ण स्पष्टपणे चतुर्भुज आहे. देवगढ येथून मिळालेल्या व आज प. बर्लिनमध्ये असलेल्या एक शिळाखंडावर धनुर्धर अर्जुनाचेजवळ चतुर्भुज श्रीकृष्ण आसनांवर बसलेला आहे. " अर्थात् गुप्तकाळांत ही परंपरा जिवंत होती असे म्हणावे लागेल. कृष्णलीला दृश्यांत मात्र बऱ्याच ठिकाणी तो द्विभुज दाखविला आहे.
कुषाण काळांतील कृष्णलीला-दृश्यांचा वर उल्लेख आला आहे; गुप्तकाळांतील अशा प्रतिमांचा थोडक्यांत आढावा घेऊ, अशी प्रमुख शिल्पें निम्नलिखित आहेत.
१) देवगढ (झाशी) येथील नंदयशोदजवळ कृष्ण बलराम, शकटासुर वध, कृष्ण-सुदामा, वगैरे
२) भारतकला भवन, वाराणसी येथील रांगता कृष्ण व यशोदेचे दधिमंथन.
३) श्रावस्ती येथील यशोदा कृष्ण, एक मृफलक (ल.सं.सं. ६७.१२४).
४) एरण (मध्यप्रदेश) येथून मिळालेली यमलार्जुन, कालियादमन, यशोदाकृष्ण, वगैरे दृश्यें.
५) जोधपूरजवळ मण्डोर येथून मिळालेल्या केशीवध, प्रलंबवध, चोरी, वगैरेचे दर्शन घडविणारे खांब."
६) वलभी (सौराष्ट्र) येथून हाती आलेली केशीवध करणाऱ्या कृष्णाची खंडित प्रतिमा.
७) काठमांडू (नेपाळ) च्या बसंतपूर महालात असलेली कालियादमन करणाऱ्या कृष्णाची मूर्ती. थोडे नंतरचे हेच दृश्य मथुरेंतही मिळते.
८) वरील सर्व दृश्यांपेक्षा कृष्णाचे गोवर्धन धारण हे दृश्य जास्त लोकप्रिय असावे असे वाटते. गोवर्धनधारी कृष्णाची एक विशाल प्रतिमा भारतकला भवन, वाराणसी येथे आहे. हेच दृश्य मंडोर (राजस्थान) येथून मिळालेल्या एका शिळापट्टावर आहे. हे कथादृश्य मध्य आशियात मिळालेल्या एका मडक्याच्या तुकड्यावर सुद्धा अंकित केलेले हाती आले आहे.
९) याशिवाय भीतरगांवच्या इष्टिका मंदिरावर असलेली कृष्ण-कथा-दृश्यें उदा. केशीवध, कृष्णांची कुवलयापीडाशी झुंज, एका दैत्यांस गुद्दे मारणे, कंसवध या प्रसंगानें उल्लेखनीय आहेत.
१०) याच संदर्भात इकडे तिकडे विखुरलेल्या चौकोनी दगडी खांबाकडेही लक्ष पुरविले पाहिजे, ज्यांच्या चारी बाजूला लहान लहान चौकटीतून कृष्णलीलांची बारकी दृश्यें कोरलेली असतात. 'Krsnalila oblisques' म्हणून ओळखले जाणारे हे लहान मोठे खांब गुप्तकाळांपासून मध्यकाळाच्या शेवटपर्यंत कोरले जात असत.
वर नोंद केलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या कृष्ण लीला दृश्यांचा साकल्यानें विचार केला तर एक गोष्ट अगत्याने लक्षांत येते की सर्व कथा दृश्यें बव्हंशी कृष्णाच्या बालचरित्राशीच संबंद्ध आहेत. त्यानंतरची दृश्ये फारच मोजकी आहेत. साहजिकच वर सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण पुढच्या काही दृश्यांत तो आराध्यरूपांत किंवा मोठेपणी चतुर्भुज रूपांत दिसतो. म्हणून कुषाणकाळांप्रमाणेच गुप्तकाळांतील चतुर्भुज विष्णूंच्या प्रतिमांतच कृष्णास शोधावयास हवे.

बलराम :
विष्णूच्या चार व्यूहांमध्ये संकर्षण किंवा बलरामाची गणना होते. त्याला शेषावतार असेही मानतात. पण या शिवाय 'कृष्णस्तु भगवान् स्वयम्' असें गृहीत धरून त्याला विष्णूचा आठवा अवतार म्हणूनही ओळखतात. शेषाचा अवतार, व कृष्णाचा मोठा भाऊ या नात्यानें याला मान्यता प्राप्त होती. गदायुद्धाचे आचार्यत्व, नांगर व मुसळ या शस्त्रांना हाताळण्यांची हातोटी व मद्याची आवड ही बलरामांची वैशिष्ट्ये होत. डाव्या किंवा उजव्या कानांत एकच कुंडल घालणें व निळे वस्त्र नेसणें गौरवर्ण बलरामाची व्यक्तिगत आवड होती. त्याचे एकच कुंडल गुप्तकाळांपर्यंतच्या शिल्पांत प्रामुख्याने दिसते (चित्र १७).
शिल्पांचे वर्गीकरण :
बलराम पूजनाची परंपरा कुषाण काळांत बरीच वाढीस लागली. ब्राह्मणधर्माबरोबरच या काळांत बलरामाला जैन धर्मात देखील मान्यता मिळाली. त्याची घडण ब्राह्मण बलरामांसारखीच आहे. कुषाण बलरामाच्या एकूण २६ मूर्ती आपणांस माहीत आहेत. हातांची संख्या सापांचे अस्तित्व व आयुध भेद या आधारांवर या प्रतिमांना मुख्यतः चार गटांत वाटतां येईल :गट - १: डोक्यावर फणाटोप किंवा सर्पफणा, उजवा हात उगारलेला तळहात उघडा व डाव्या हातांत मद्याचा पेला. हा गट कुषाण काळांत सर्वाधिक लोकप्रिय होता. (रे.चि. सतरा ६) यांच्या सोळा प्रतिमा आपणांस माहीत आहेत. या पद्धतीच्या मथुरा संग्रहालयांत असलेल्या उपप्रकारांत मागील बाजूस आयुधेही कोरलेली दिसतात.
गट -२ : डोक्यावर फणाटोप, उजवा हात अभयमुद्रेत व डाव्या हातांत नांगर.
गट - ३ : फणाटोपाशिवाय चतुर्भुज मूर्ती. या प्रकारांत बहुतेक बलरामाच्या हातांत सिंहांकित नांगर (हिलांगल) व गदा असते. अशा प्रकारच्या चार प्रतिमा मिळाल्या आहेत (चित्र १७). या गटाचा उपप्रकार म्हणजे गदेच्या ऐवजी मुसळ असणें हा होय. याच गटाचा तिसरा उपप्रकार कोण्डामोतूच्या शिळापट्टांवर आहे. येथे बलराम द्विभुजच आहे.
गट -४ : हा मूर्तीचा वेगळा असा प्रकार नसून यांत बलरामांचा अन्य देवतांशी संबंध दिसतों. उदा. चतुर्व्यहांत बलराम (रे.चि. सोळा ३), कृष्ण व एकानंशेसह बलराम (रे.चि. पंधरा ६) व तीर्थंकर नेमिनाथाचा पार्श्वचर बलदेव (चित्र १७).
कुषाण बलरामांची कांही वैशिष्ट्यें :
पागोटें किंवा उष्णीष :
कुषाण काळापर्यंतच्या सर्वच प्रतिमांमधे हैं आढळतें (रे. चि. सतरा १,२), मात्र कुषाणकाळांत मधल्या बदामी तुऱ्याच्या आजुबाजूला एक एक अतिरिक्त तुराही लावलेला दिसतो (रे.चि. सतरा ३,५).साप :
बल्गाम हा शेषावतार असल्यामुळे वरील तिसरा गट सोडल्यास इतर प्रतिमांत त्याचे डोक्यावर सर्पफणा किंवा सगाटोप आहेतच. कुषाण कलेत सांपाचे सर्वसाधारण अंकन करीत असताना काही गोष्टींकडे बारकाईनें लक्ष पुरबिले नाई अर्थात् बलराम शिल्पेही त्याला मुळीच अपवाद नाहीत. या गोष्टी म्हणजे२) कधी सापाचे सरीर (आभोग) खांगासारखें उभे दिसते (रे. चि. चाळीस ३,४) व कधी वेटोळ्या दिसतात. खालच्या टोकास शेपटी असते (रे. चि. चाळीस २).
३) सापांचे सारे शरीर लहान लहान वर्तुळे, त्रिकोण, डोळे, तीन कमानी, वगैरे आकृत्यांनी भरलेले असते. कुषाण काळानंतर ही चिन्हे मावळतात. (रे. चि. चाळीस ५)
४) मस्तकामागें असलेली सर्पफणा प्रभा मंडळासारखी दिसते (चित्र. १६).
५) या सर्पफणांच्या वर बहुतेक स्वस्तिक, पूर्णघट, मीनयुगल, श्रीवत्स, वगैरे मंगल चिन्हे आढळतात. हरिवंशही बलरामांचे डोक्यावर असलेल्या स्वस्तिक चिन्हाचे वर्णन करतो ०७ (चित्र. १६२).
६) या काळांतील सर्वच सांपाच्या तोंडातून विषदंत किंवा जिभा बाहेर आलेल्या दिसतात.
सिंह :
बलरामाचे सिंहाशीही जवळचे नाते असावे. त्याचे नांगरावर सिंहाची आकृती दिसते. म्हणूनच त्याला सिंहलांगल असे म्हणतात. याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. एका कुषाण शिल्पांत बलरामांच्या एकुलत्या एक कुंडलांत सिंहाची आकृती खुबीने वापरलेली आहे. (म.सं.सं.सी. १५, चित्र १६) पुढें मिळणाऱ्या वैकुंठ मूर्तीत संकर्षण किंवा बलरामांचे प्रातिनिध्य सिंहमुखानेंच झालेले आहे (रे.चि. चौदा ४).बलराम हा वृष्णिकुळांत जन्मला होता. वृष्णिराजन्यगणाच्या एका नाण्यांवर एक खांब आहे ज्याचा वरच्या टोकावर सिंह व हत्ती यांची मिश्रित आकृती दिसते.
आयुधे :
बलरामांची प्रमुख आयुधे म्हणजे अपराजित किंवा संवर्तक नांवाचा नांगर व सौंनंद नांवाचे मुसळ ही होत त्याचे दुसरे आवडते शस्त्र गदा होते. त्याच्या व विष्णूच्या गदेंत फरक आढळत नाही.कुण्डल :
बलरामांचे एक कुंडल हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य होय या मुळेच वाङ्मयात त्याचे उल्लेख 'कान्तैककुंडलधरः', 'वामैककर्णामलकुण्डलश्रीः', 'कुंडलैकधरः', वगैरे स्वरूपांत मिळतात. शिल्प व शिल्पशास्त्र दोघांनाही हे मान्य आहे (रे.चि.सतरा ३).मद्याचा पेला :
बलरामाची ही खूण बऱ्याच शिल्पांत आढळते फक्त पेल्याच्या आकारांत व धरण्यांच्या पद्धतीत फरक होतो. (चित्र १६, रे.चि. सतरा ६)गुप्तकाळांतील बलराम :
शुंगकाळांतील साध्यासुध्या बलरामानें कुषाणकाळांत तीन गटात वाटली जाण्यासारखी बरीच रूपें धारण केली हे नुकतेच पाहिले. पुढे गुप्तकाळांतील प्रमुख परिवर्तन म्हणजे आपण उल्लेखिलेले गट संख्या एक व दोन यांचे गट संख्या तीनशी झालेले मिश्रण होय. गुप्तकलाकारांनी बलरामाचे नागरूप स्वीकार केले पण ते आता त्याला गदा किंवा मुसळ, नांगर आणि मद्याचा पेला या सह चार हातांचा दाखवू लागले. त्याचा वर उगारलेला साधारण उजवा हात तसाच राहिला.कुषाणकाळांपेक्षा गुप्तकालांत बलरामाची उपासना रोडावू लागली या काळांतील मूर्तीची संख्या बरीच कमी म्हणजे तूर्त माहितीत फक्त सहा एवढीच आहे.
गुप्तकाळांतील अनंताच्या मूर्तीला बलराम प्रतिमेचा अवतार रूपांतील उपप्रकार मानता येईल.
बलरामाची लीला शिल्पें :
कृष्णलीला-शिल्पांच्या मानांने यांची संख्या फारच थोडी आहे. चन्दौसी (उ.प्र.) येथून मिळालेल्या एका मृफलकांवर बलरामचे प्रलंबासुरांशी युद्ध दाखविले आहे. सीरपूर (म.प्र.) येथे लक्ष्मण मंदिरावर कोरलेल्या एका दृश्यांत बलराम सूत लोमहर्षण याचा वध करीत आहे असें दाखविले आहे. * मांढळ (जि. नागपूर, महाराष्ट्र) येथून 'धेनुकासुर वधमूर्ति मिळाली आहे. 'चातुर्विंशती विष्णुमूर्ती :-
विष्णूच्या अन्य मूर्ती :-
खजुराहो येथील विष्णूचे प्रमुख मंदिर

लक्ष्मण मंदिरातील विशेष शिल्पे
ज्ञान परंपरेचे महत्त्व :-आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा आहे असा सहज उल्लेख केला जातो. परंतु खजुराहोमधील शिल्यांकन पाहिल्यावर गुरुशिष्य ही आपली परंपरा नसून ती शिक्षण पद्धती आहे. परंपरा ही ज्ञानाची किंवा ज्ञानार्जनाची आहे. हे ज्ञान अति पवित्र असते. त्यामुळे ते सगळ्यांना वाटायचेही नसते. इति गुह्यतमं शास्त्रं असे पंधराव्या अध्यायात भगवंताने म्हटले आहे. खजुराहोच्या संग्रहालयामध्ये या वाक्याचे प्रतिनिधित्व करणारे एक अत्यंत दुर्मिळ शिल्प आहे. पद्मासनात बसलेल्या विष्णूने आपल्या डाव्या हाताची तर्जनी तोंडावर ठेवलेली आहे. हे विष्णूनारायणाचे गोप्ता किंवा मौन-व्रती (रहस्यधारी, गुप्तता पाळणारा) हे रूप आहे. अठरा अक्षौहिणीचे विराट सैन्य सभोवती होते त्यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि ज्ञानीही होते. संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान सांगणारे साक्षात भगवंत तेथे होते, तरीही श्रोता मात्र एकच होता. हे ज्ञान एकाने एकालाच द्यावयाचे असते हा संकेत होता.
कूर्म नारायण :-
समुद्रमंथनाच्या प्रसंगी विष्णूने कूर्माचे रूप घेतले आणि त्या वेळेस त्याने नारदाला काही ऋषींच्या उपस्थितीत ते दिव्य ज्ञान दिले. या शिल्पामध्ये हा प्रसंग दाखवला आहे. कुर्मावरील विष्णू चार हातांचा असून तो पद्मासनात बसलेला आहे आणि त्याचे नैसर्गिक दोन हात ध्यान मुद्रेत आहेत आणि वरील डाव्या उजव्या हातात अनुक्रमे चक्र आणि गदा आहेत. त्याच्या समोर हात जोडून नारद आणि काही तपस्वी बसलेले आहेत. आणि विष्णूच्या मागे सहा ऋषी उभे आहेत.

:कूर्मनारायण, खजुराहो
मत्स्य नारायण :-
महाप्रलयामध्ये संपूर्ण सृष्टीचा विलय झाला, त्या वेळेस विष्णूने मत्स्याचे रूप घेऊन वैवस्वत मनू आणि सप्त ऋषींना वाचवले. या शिल्पपटात वरील प्रमाणेच ध्यानस्थ विष्णूची पद्मासनातील मूर्ती असून त्याच्या मांडीखाली आसनावर लांब मासा कोरलेला दिसतो. शेजारी अत्यंत वयोवृद्ध मनू हात जोडून बसलेला आहे. ज्याच्या सोबतीला दोन सेवक आहेत. या शिवाय विष्णूच्या मागे सहा उभे आणि पायाशी एक बसलेले असे सात ऋषी - अत्री, वशिष्ठ, कश्यप, गौतम, भारद्वाज, विश्वामित्र आणि जमदग्नी आहेत, ज्यांना सप्तर्षी असे संबोधले जाते.

मत्स्यनारायण, खजुराहो
विष्णु-नारायण :-
याचा उल्लेख महाभारतातील एका कथेत येतो. एकदा एकत, द्वित आणि त्रित ह्या नावाचे तीन त्रि शिखंडीन संन्यासी साधू नारायणाचे दर्शन घेण्यासाठी त्याच्याकडे म्हणजे श्वेत द्वीपावर गेले, तेजोमय वातावरणाने त्यांचे डोळे दिपले आणि दृष्टी गेली. त्यांनी तेथे शंभर वर्ष घोर तपस्या केली, ज्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे त्यांना तिथल्या नारायणाच्या साधनेत असलेल्या तेजःपुंज तपस्वींचे दर्शन झाले. अचानक एक प्रखर प्रकाशाचा झोत प्रकटला आणि रमः असे म्हणत ते श्वेत द्विपवासी हात जोडून तिकडे धावले. या तिघांना साक्षात नारायण प्रकटले असल्याचे समजले. परंतु अति जर्जर झाल्यामुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत किंवा त्याला पाहू शकले नाहीत. त्या वेळेस आकाशवाणी होऊन नारायणाने त्यांना दिव्य ज्ञान दिले, जे घेऊन ते परत आले. या शिल्पपटात पद्मासनात ध्यान मुद्रेत बसलेली विष्णूची मूर्ती असून त्याच्या वरच्या डाव्या उजव्या हातात अनुक्रमे शंख आणि चक्र आहेत. त्याच्या मागे सहा श्वेतद्विपावरील ऋषी उभे असून त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे प्रभावळ दाखवली आहे. दोन्ही गुढघे आणि कमरेभोवती योगपट्ट गुंडाळून देवाकडे पाठ करून बसलेला एक ऋषी आहे ज्याचे शरीर खंगून अस्थिपंजर झाल्याचे दाखवलेले आहे. हा त्या तिघांपैकी एक तर दुसरीकडे दोन श्वेत द्विपवासी यांनी मध्ये होम पेटवून ते त्यात आहुती देत आहेत.

योगनारायण, खजुराहो
या मंदिरामध्ये एकत्रितपणे अनेक कृष्णलीलांचे मनोहारी शिल्पांकन केलेले आहे. गर्भगृहाच्या भोवती आपल्याला ही शिल्पे दिसतात. ही शिल्पे अन्य शिल्पांच्या मध्ये मध्ये कोरलेली आहेत. डावीकडून प्रदक्षिणेला सुरुवात केल्यास १. तृणावर्तवधाचे शिल्प आहे. हा वादळाचे रूप असणारा राक्षस गवताच्या काड्यांचा वेश घेऊन आला. परंतु कृष्णाने त्यास ओळखले व मारले. २. निमिषारण्यामध्ये बलरामाने रोमहर्षणसुताला मारल्याचे शिल्प आहे. ३. कृष्णाने चाणुराला (कंसाचा मल्ल) ठार करतानाचे शिल्प आहे. ४. कुवलयपीड नावाच्या कंसाच्या हत्तीला कृष्णाने ठार मारल्याचे शिल्प आहे. पश्चिमेकडील (मागील बाजूस)
भितीवर ५. कालिया मर्दनाचे यामध्ये मनुष्यरूपी कालिया जो कमरेखाली सर्प रूपात दिसत आहे ठार करतानाचे शिल्प आहे. ६. कृष्णाने शालाला (कसाचा मल्ल) ठार करतानाचे शिल्प त्यानंतर कृष्णाद्वारे कुब्जेचा उद्धार हे शिल्प आहे. ८. शकट भंग - कृष्णाने बैलगाडी तोडताना शिल्प. त्यानंतर उत्तरेकडील भिंतीवरील शिल्पे ९. कृष्णाद्वारे बैल रूपात आलेल्या अरिष्टासुराचा वध केलेले शिल्प आहे. १०. त्यानंतर यमलार्जुन वधाचे शिल्प आहे शापित होऊन वृक्ष रूपात अडकले दोन यक्षांना कृष्णाने ते वृक्ष तोडून मुक्त केले. ११. पुढे पूतनावधाचे शिल्प आहे. तर शेवटी वासराच्या रूपात आलेल्या वत्सासुराचा वध करताना कृष्णाचे शिल्प आहे.
खजुराहोतील अन्य विष्णू मंदिरे
वराह मंडप :-लक्ष्मण मंदिरांच्या समोरच एका मंडपाखाली महावराहाचे शिल्प आहे. याला स्वतंत्र वराह जरी म्हटले गेले असले तरीही ज्याप्रमाणे शिव मंदिरासमोर नंदी असतो, विष्णू मंदिरासमोर या मूर्ती स्थापना करण्याची पण पद्धत होती. हा मंडप तंतोतंत जरी या पद्धतीत बसणारा नसला हो साधारण प्रयोजन तसेच दिसते. यामध्ये एक विशाल वराहाचे (त्याची लांबी पावणे नऊ आणि पावणे सहा फूट आहे) शिल्प असून त्याच्या अंगावर असंख्य देव कोरलेले आहेत. यज्ञवराह शिल्पाचे नाव आहे. हे विष्णूचे 'सर्वदेवमय' असे रूप असते. या वराहाच्या पायाखाली एक प्रचंड कासव कोरलेले आहे. आणि वराहाच्या पायांमध्ये शेष सर्प कोरलेला आहे. आदी कुर्मावर शेष त्यावर विष्णू अशी या रचनेची संकल्पना आहे. वराहाच्या डाव्या सुळ्याला धरून उभ्या असलेल्या लक्ष्मीची पूर्णाकृती मूर्ती कोरली होती. आज केवळ तिची पावलेच दिसतात. वरच्या तोंडावा सा
दक्षिण भारतांतील समकालीन विष्णुशिल्पें :
या नंतरचे म्हणजे वेंगीच्या शालंकायन राजांच्या वेळचे (सु.इ.स. ३५०-४३०) एके शिल्प गुंतूर जिल्ह्याच्याच कुणिदाने नावांच्या गांवातून मिळाले आहे. यांत ब्रह्मदेव व शिवलिंगा बरोबरच सिंहरूपांत नरसिंहाचे दर्शन घडते. कोण्डामोतु-नरसिंहाप्रमाणे जरी याच्याजवळ गदा व चक्र धरणारे मानवस्त नसले जरी त्याचे पाय माणसाचे असून ओटीपोटावर नेसूंच्या वस्त्राची चिन्हे ही आहेत.
सुमारे तिसऱ्या चौथ्या शतकांत आंध्रप्रदेशातच असलेल्या एका अष्टभुज विष्णूच्या काष्ठशिल्पाचा उल्लेख नागार्जुन कोंड उत्खननांत सापडलेल्या एका शिलालेखांत मिळतो.
याप्रमाणें आंध्रप्रदेशांत पेरले गेलेले वैष्णव संप्रदायाचे बी हळुहळू रूजू लागले. सुमारे इ.स. ४४०-६१६ मधे राज्य करणाऱ्या 'विष्णुकुण्डिन' वंशाच्या राजाच्या वेळी या प्रदेशातील पेड्डमुड्डीयम् येथून मिळालेल्या कलाकृतीत गणपती, ब्रह्मा, शिवलिंग, देवी, उमामहेश्वर, श्रीवत्सरुपिणी लक्ष्मी व महिषमर्दिनी या बरोबरच विष्णू व नरसिंहाचे दर्शन घडते विशेष म्हणजे असे की येथे महिषमर्दिनीला सोडून बाकी सर्व देव द्विभुज दाखविले आहेत.
या बरोबरच जवळ जवळ याच काळांतील विजयवाड्याजवळील उंडवल्ली व मोगलराजपुरम् येथील गुहालेणी उल्लेखनीय आहेत. या लेण्यांत वराह, हिरण्यकशिपूशी झगडणारा नरसिंह, त्रिविक्रम व गोवर्धनधारी कृष्णांच्या प्रतिमा आहेत.
दक्षिण भारताच्या उत्तरेकडील भागांत गुप्तांना समकालीन असे वाकाटकांचे राज्य होते. अजिंठा येथील नंतरची काही लेणी, वेरुळची सुरुवातीची गुहाशिल्पें व घारापुरी आणि औरंगाबादच्या कलाकृती वाकाटक कलेची उदाहरणें होत. यांत वेरूळ येथे त्रिविक्रम, नरसिंह, शेषशायी विष्णू, वगैरे विष्णुशिल्पांवर उत्तर भारतीय कलेची चांगलीच छाप आहे.
दक्षिणेतील विष्णु-शिल्पांची वैशिष्ट्ये :
गुप्तकाळापर्यंतच्या उत्तरभारतीय विष्णुशिल्पांशी दक्षिणेतील कलाकृतींची तुलना केल्यास खालील गोष्टी ठळकपणें नमूद कराव्या लागतात.१) इकडे स्थानक, आसन व शयन तिन्ही प्रकारच्या प्रतिमा लोकप्रिय होत्या.
२) विष्णूच्या 'उदबाहू' प्रकारच्या मूर्तीचा विशेष प्रघात असून मागच्या वर उचलेल्या हातांत चक्र व शंख ही आयुधे दिसतात. उत्तरेप्रमाणे इकडे गदा अपरिहार्य नाही. त्यामुळे साधारण दोन्ही हात बऱ्याचदा रिकामेच दिसतात.
३) इतर आयुधांत अक्षमाला क्वचितच दिसते. (ऐहोळेच्या एका अपूर्ण प्रतिमेत ती आहे) फळ व घट दिसत नाहीत. खड्ग शेषशायी प्रतिमेत कर्धी कधीं आढळते.
४) आयुधपुरुषांना विशेष प्राधान्य नाहीं.
५) दागिन्यांचा विचार केल्यास उत्तरेपेक्षा इकडे दागिने जास्त आहेत. जानव्यासारखा घातलेला जाडजूड दागिना, उदर बंध, गळ्यातील रुंद प्रकारच्या माळा, जाडसर अंगद व कंकणें इकडे बरीच दिसतात.
लक्ष्मीचे एक प्रतीक म्हणून श्रीवत्स जरी यावेळी इकडे माहित होते, तरी विष्णूच्या वक्षस्थलांस अलंकृत करण्याकरितां त्याचा उपयोग बरेच दिवसपर्यंत होत नसे.
६) उत्तरेच्या मानानें दक्षिणेत वनमालेचेही प्रामुख्य कमीच दिसते.
७) वराह, शेषशायी, त्रिविक्रम, वगैरे सारख्या काही प्रतिमा वगळल्यास साधारणपणें विष्णुप्रतिमेंत परिवार देवतांचे फारसे दर्शन होत नाही.
८) उत्तरेंत दिसून येणारी विश्वरूप, चतुर्व्यह वैकुंठ, वगैरे रूपें इकडे दिसत नाहीत, पण शेषावर बसलेल्या नारायणांच्या मात्र प्रतिमा एकाधिक मिळतात. अवतारांत वराह, त्रिविक्रम व नरसिंह चांगलेच लोकप्रिय आहेत.
दक्षिणेतील वराहमूर्तीत ठळकपणें दिसणारी गोष्ट म्हणजे पृथ्वी होय. हिला नृवराहाचे दाढेवर न दाखविता नखरेलपणें कधी सुटी तर कधी त्याच्या मुखाचा आश्रय घेत त्याच्या सामान्य उजव्या हातावर उभी दाखवतात. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तरेंत त्याच्या पायाखाली असणारा नाग येथे सपत्नीक दिसतो व कुठे तर तो समोर हात जोडून उभा असलेला दाखवितात.
त्रिविक्रमांच्या अंकनात मात्र फारसा फरक नाही. तो अष्टभुज असून त्याने डावा पाय आकाशांकडे उचललेला आहे. खालच्या बाजूला बटु वामनांचे हातांवर राजा बळी दानोदक ओतण्यास तयार आहे. नरसिंहाचे तर येथें एकाधिक प्रकार आढळतात. सिंह-रूपात असणाऱ्या नरसिंहाचे उल्लेख वर आलेच आहेत. याशिवाय उभा राहून हिरण्यकशिपूशी झगडणारा अष्टभुज, त्याला मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडणारा चतुर्भुज , एकटा सुखाने उभा असलेला (केवळ) चतुर्भुज नरसिंह, असे बरेचसे प्रकार दिसतात.
९) विष्णूच्या शयनमूर्ती उत्तरेपेक्षा दक्षिणेंत संख्येने जास्त व आकारानें मोठ्या आहेत. उत्तरेपेक्षा येथील नागाच्या वेटोळ्या तर वेगळ्या प्रकारच्या आहेतच पण त्याशिवाय विष्णूचे पाय चुरणारी लक्ष्मी व त्याच्या नाभीतून निघालेले कमळही येथे दिसत नाही. बदामी व ऐहोळे येथे त्याचे पाय सरळ पसरलेले नसून आढी घातलेले आहेत, या मूर्तीत उजवा हात उशाला घेतलेला आहे पण या नंतरच्या महाबळीपूरम येथील प्रतिमेत तो सरळ डोक्याकडे पसरलेला आहे. परिवार देवतांत गरुड, युद्धोत्सुक मधुकैटभ व कांही इतर देवगण वगैरे दिसतात.
येथपर्यंत प्रत्यक्ष प्रतिमांच्या आधारांवर दक्षिणेतील सहाव्या शतकांच्या शेवटपर्यंतच्या विष्णु-मूर्तीचा धावता आढावा घेतला. तो नीट समजून घेण्यास समकालीन वाङ्मयाची किल्ली हाताशी धरली पाहिजे. पण आपणांस त्या बाजूकडे वळणे शक्य होणार नाहीं. तरीपण बरेंच गाजलेल्या प्राचीनतम तामिळ वाङ्मय अर्थात् संगम साहित्याकडे विष्णुमूर्तीविषयी माहिती मिळविण्याकरितां ओझरता दृष्टिक्षेप करणें प्रासंगिक होईल.
संगम वाङ्मयांत विष्णू :
इसवी सनांच्या सुमारे चौथ्या शतकांपूर्वी पांचशे वर्षाच्या कालखंडांत पसरलेले जुने तमिळ वाङ्मय म्हणजेच "संगम वाङ्मय' होय. यातील सिलप्पदिकारम्, परिपाडल आणि मणिमेकलई या ग्रंथांत सरासरी तिसऱ्या शतकांपर्यंतच्या वैष्णव देवतांचा विकास पाहता येतो.विष्णू किंवा तिरुमल हा श्यामल वर्णाचा असून तो पीतांबर व कौस्तुभ धारण करतो. त्याच्या डाव्या हातात शंख व उजव्यात चक्र असते. या शिवाय गदा, शार्ड धनुष्य व खड्ग ही त्यांची इतर आयुधें होत. तो गरुडध्वज तर आहेच पण या शिवाय तो हलध्वज, तालध्वज आणि गजध्वज ही आहे. याप्रसंगानें आपण मागें उल्लेखिलेल्या 'वृष्णिराजन्यगणा'च्या नाण्यांवरील सिंह-गज ध्वजाकडे लक्ष जाणें स्वाभाविक आहे, अर्थात् सिंहध्वज हा तेथे बलरामाचा तर गजध्वज हा कृष्णाचा हे उघड आहे.
या वाङमयात विष्णुशिल्पांचे स्थानक, आसन व शयन असे तीन ठोकळ गट पाडून चर्तुव्यूह, पंचवीर, अष्टभुज, शेषशायी, वगैरे प्रकारच्या प्रतिमांचे उल्लेख आहेत. कृष्ण व बलरामाला इकडे ही महत्त्वाचे स्थान होते. बलरामांची स्वतंत्र मंदिरे ही असल्याचें दिसते. कृष्णांची मुख्य उपासना गोपाल या रूपांत केली जात असे व तो कुरणें आणि मैदानी मुलुखाचा अधिपती मानला जाई. नृत्यांशी ही त्याचा जवळचा संबंध होता.
इतर अवतारांत वामन-त्रिविक्रमांचे स्थान बरेच वरचे आहे. वराह व नृसिंहाचे उल्लेख सीमित आहेत. परशुरामांचा कोंकण व केरळ याच्या उत्पत्तीशी संबंध आहे. रामकथेची संगम साहित्याला ओळख आहे पण विष्णूच्या अवतार रूपांत त्याचे उल्लेख मात्र थोडे आहेत. रामांची स्वतंत्र अशी मूर्ती चोळ राजांच्या उत्थान कालांपर्यंत मिळत नाही हें ही या संदर्भात लक्षांत ठेवावयास हवे.
विष्णु २
विशिष्ट रचनेची वैचारिक बैठक :
विष्णुमूर्तीचे प्रथम वर्गीकरण:-
द्वितीय वर्गीकरण, चतुर्विंशतिमूर्ती :
|
विष्णू |
||||
|
वासुदेव |
संकर्षण |
प्रद्युम्न |
अनिरुद्ध |
व्यूह |
|
केशव, नारायण |
गोविंद, विष्णू |
त्रिविक्रम, वामन |
हृषीकेश, पद्मनाभ |
विभव |
|
माधव |
मधुसूदन |
श्रीधर |
दामोदर |
|
|
अधोक्षज, पुरुषोत्तम |
अच्युत, उपेंद्र |
नारसिंह, जनार्दन |
हरि, कृष्ण |
नवी आठ रूपें |
|
कृष्णकार्तिकेय |
तार्क्ष्यध्वज |
जयंत |
गोवर्धन |
नवी चार रूपें |
भारतीय मूर्तिशास्त्र पूर्वभारतीय कलेत विष्णू
विष्णुमूर्तीची वैशिष्ट्ये :
पूर्व भारतीय कलेतील काही विशिष्ट प्रतिमा :
अवतार :
गरुडारूढ विष्णू :
विष्णूपट :
लक्ष्मीनारायण -
जगन्नाथ -
जगन्नाथ-नरसिंह :
विश्वरूप :
गरुडारूढ वैकुंठ :
इंद्र-वैकुंठः
नरसिंह :
काही विशिष्ठ कृष्णलीला :

शेषशायी आणि शिव :
वैकुंठ बिंबब्रह्म :
विष्णू-ब्रह्मा :
विष्णू-कुबेर :
शेषषायी :
गरुडारूढ वैकुंठः
वैकुंठलक्ष्मी :
कालिय दमन :
कृष्णाभिषेक :
योगेश्वर मुरलीधर :
मदनगोपाळ :
शिवपूजक विष्णू-

शेषशायी :
नाचणारा विष्णू-नृत्य विष्णू :
पंचमुख नरसिंह :
बुद्धावतार, मायामोह :
शेषशायी :
पांडुरंग/विठ्ठल :
दिल्ली नॅशनल मुझियम मधील संकर्षण (विष्णू) मुर्ती :-
भारतीय संस्कृतीचे अनेक पैलू आणि वैशिष्ठ्य आहेत, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मूर्तींची पूजा. परकीय आक्रमणे सुरू झाली आणि आपल्याकडे होणारी वैचारिक प्रगती थांबली, यामुळेच शिल्पकला याकडे दुर्लक्ष झाले. नंतरच्या काळात परकीय अभ्यासकांनी भारतीय शिल्पांची वर्णने ही बीभत्स किंवा भयंकर शिल्पं असतात आणि यापलीकडे याला काही महत्त्व नाही अशी केली. आपले साहित्य शब्दशः भाषांतर करून मूळ मुद्द्यापासून लांब नेले. आपल्याकडच्या अनेक साहित्यिकांनी आणि अभ्यासकांनी हीच री पुढे ओढली. पण डेक्कन कॉलेज चे सांकलिया सर, डॉ. नि. पु. जोशी, डॉ. देगलूरकर, डॉ. जामखेडकर, डॉ. ढवळीकर, किरीट मंकोडी अशा अनेक अभ्यासकांनी या कलेच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कै. उदयन इंदूरकर सारख्या माणसांनी जनमानसात हा विषय रुजवला.
शिल्प किंवा मूर्ती हे आपल्याकडे साध्य नसून साधन आहे त्या पाठीमागे लपलेल्या संकल्पनेला समजून घेण्यासाठीचे. तीन महत्त्वाच्या देवांपैकि एक म्हणजे विष्णू. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील याचे अनेक उपासक आहेत. जगातले सगळ्यात मोठे विष्णू मंदिर हे भारतात नसून बँकॉक पासून जवळ असलेल्या कंबोडिया नावाच्या देशात आहे. मूर्तीच्या मागे लपलेल्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर आधी ती मूर्ती समजून घेणे गरजेचे आहे. या फोटो मध्ये असलेला विष्णू आता बघुयात. डावीकडून बघताना हातामध्ये कौमोदकी नावाची गदा दिसते, पांचजन्य शंख, डोक्यावर प्रभावळ आणि किरीट मुकुट, पद्म किंवा कमळ आणि सुदर्शन चक्र अशी आयुधे आहेत. छातीवर श्रीवत्स नावाचे चिन्ह दिसते आहे. 'अहिर्बुध्न्य संहिता ' नावाच्या उपनिषद ग्रंथात विष्णूच्या हातांचा आणि आयुधांचा नक्की अर्थ काय आहे याचे वर्णन आले आहे. विष्णू हा मत्स, कुर्म, वराह, वामन, इत्यादी अनेक अवतरांमध्ये दिसतो. भक्तीचे महत्त्व समाजात पसरवण्याचे खूप मोठे श्रेय हे या वैष्णव संकल्पनेला जाते.
मध्य आणि पश्चिम भारतीय कलेंत विष्णू :
क्षेत्र व विस्तार :
विष्णुप्रतिमांची वैशिष्ट्ये :
लक्ष्मी व गरूड :
आयुधपुरुष :
द्वारपाल :
बुध्द -
कल्की-
हयग्रीव :
विष्णूची रूपें व विशिष्ट प्रतिमा :
कृष्ण आणि पुतना
शिल्प - कृष्ण आणि पुतना, बिजा मण्डल, मध्य प्रदेश ( ९ वे शतक)पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्रीने बाळाला स्तनपान देताना देखील आपले दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.
एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे आहे.
नरसिंह
उग्र नरसिंह
हा नरसिंह आठ हातांचा आहे. चार हातात विष्णुची आयुधं (शंख चक्र गदा इ. दिसत आहेत) दोन हातांनी हिरण्यकश्यपुचा पाय आणि डोके पकडले आहे. आणि बाकी दोन हातांनी नखाच्या सहाय्याने पोट फाडलेले दिसत आहे.
वरील मुर्ती उग्र नरसिंह अथवा विदारण नरसिंह म्हणून ओळखली जाते. नरसिंहाच्या अजून दोन मुर्ती प्रचलीत आहेत. योगमुद्रेतील शांत सौम्य मुर्तीला योग नरसिंह म्हणतात. तिसरी मुर्ती लक्ष्मी बरोबरची तिला लक्ष्मी नरसिंह किंवा भोग नरसिंह असे म्हणतात,
नरसिंहाची जी प्राचीन मंदिरे आहेत त्यात गोदावरी काठी नांदेड जिल्ह्यात राहेर येथे आहे (बाकी बहूतांश मंदिरे तुलनेने अलीकडच्या काळातील आहेत). नांदेड परभणी परिसरात या तीन प्रकारच्या नरसिंहाला बोली भाषेत आग्या नरसिंह, योग्या नरसिंह आणि भोग्या नरसिंह अशी नेमकी अनुप्रास जुळणारी नावे आहेत. प्रत्यक्ष मंदिरं कमी असली तरी बहूतांश विष्णु मंदिरांवर उग्र नरसिंहाचे शिल्प बाह्य भागात, देवकोष्टकात आढळून येते.
अर्ध सिद्धासनातील नृसिंह मुर्ती फारच थोड्या आहेत. हा नरसिंह दोनच हातांचा आहे त्यामुळे पण याचे वेगळेपण दिसून येते (पैठण येथे १४ हातांची विदारण नृसिंह मुर्ती आहे). राजापुर येथील तिन्ही मुर्ती त्यांच्या विलक्षण शिल्पसौंदर्याने अभ्यासकांना चकित करतात. या मुर्तींचा कालखंड १३ व्या शतकापर्यंत मागे जातो. विष्णुच्या याच अवतारातील मंदिरे ११ व्या ते १४ व्या शतकात जास्त आढळून आली आहेत. बाकी विष्णु अवताराची मंदिरे जवळपास नाहीतच. (फोटो सौजन्य हरिहर भोपी, औंढा)
१४ हातांचा विदारण नरसिंह :-
नरसिंह रूपातील विविध मुर्ती प्रचलीत आहेत. त्यातील विदारण्य म्हणजेच उग्र नरसिंह मुर्तीला चार, सहा, आठ हात दाखवले जातात. पण पैठण येथील ही मुर्ती सगळ्यांत वेगळी यासाठी आहे की तिला सगळ्यात जास्त म्हणजे १४ हात दाखवले आहेत. उजव्या बाजूला खङग, अंकुश, पद्म, बाण, चक्र दिसून येतात. तर डाव्या बाजूला खेटक (ढाल), फासा, गदा, खङग, शंख दिसून येतात. दोन हात हिरण्यकश्यपुचा पाय आणि डोकं धरून ठेवत आहेत. तर दोन हात त्याचे पोट फाडत आहेत.
हम्पी येथील भव्य योग नरसिंह :-
विजयनगर साम्राज्यातील या दोन्ही देवता महाराष्ट्रासाठी आस्थेचा विषय आहेत.
या नरसिंह मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची भव्यता. प्रत्यक्ष मुर्ती इतकी भव्य तर ते मंदिर केवढे असेल? एकसंध दगडात मुर्ती सोबतच मागचा भव्य शेषही कोरलेला आहे. खालच्या आसना सगट या मुर्तीची उंची २५ फुट इतकी आहे. योग मुद्रेतील या नरसिंहाच्या पायात योगपट्टा आहे. याच्या डाव्या मांडीवर लक्ष्मीचीही अतिशय देखणी मुर्ती होती. पण ती आता नाही. मुर्तीचे हातही खंडित झाले आहेत. शेषशायी विष्णुच्या माथ्यावर जसा ७ फण्याचा नाग असतो तो तसा इथेही दिसतो आहे. माथ्यावरचा मुकूट विजयनगर साम्राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारा आहे. नरसिंहाची ही सगळ्यात भव्य अशी मुर्ती समजली जाते.
याचं एक अतिशय वेगळेपण म्हणजे समोर उभं राहून चेहर्याकडे आपण बघत राहिलो तर हळु हळु इतर सर्व गोष्टी दिसेनाश्या होतात. हे उग्र सिंहमुख किंचित हसून आपल्याकडे मायाळुपणे पाहते आहे असा भास होतो. दूष्ट शक्तींचा नाश करणारा मी सज्जनांच्या पाठिशी आहे आहे असा विश्वास हा नरसिंह आपल्याला देतो. मुर्तीकडे पाठ फिरवून आपण परतत असताना एकदा तरी मागे वळून पाहण्याचा मोह होतोच. मागे वळल्यावर मुर्ती परत आपल्याला बोलावते आहे असे जाणवते.
सध्या मुर्ती भोवतीची जी दगडी रचना आहे ती बाजूला करून मुर्ती खुली केल्यास तिची भव्यता अजून जाणवेल. या मूर्ती शेजारी उग्र नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे.वरतून कोसळणार्या धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते.
भोग नरसिंह आणि योग नरसिंह :-
.भग्न मंदिरावरील उग्र नरसिंह :-
होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील जिर्णावस्थेतील सोमेश्वर महादेव मंदिरावरील हे अप्रतिम शिल्प. हा आहे उग्र नरसिंह. मांडीवरील हिरण्यकश्यपुचे पोट फाडणारे दोन हात आणि शंख चक्र धारण करणारे दोन हात असे चार हात ओळखता येतात. बाकी शिल्पावर दशावतार कोरलेले दिसत नाही. डोक्यामागे नागफणा आहे. नरसिंहाचा मुकुट स्पष्टपणे दिसतो. मंदिराच्या बाह्य भागावर मुख्य देवकोष्टकांतील जशी सूर्य नारायणाची आहे तशी ही मूर्ती असावी. .मंदिराची अवस्था पाहून याची दूरूस्ती करण्यास असमर्थ ठरलेली सरकारी यंत्रणा आणि सरकारवर दबाव टाकू शकणारे आपण या सगळ्यांच्याच नालायक वृत्तीचे पोट या नरसिंहाने फाडावे असे फार तीव्रतेने वाटते.
या मंदिरासाठी चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने ११०१ मध्ये देणगी दिल्याचा शिलालेख याच मंदिरापाशी सापडलेला आहे. मंदिराचा कालखंड अकराव्या शतकाच्या शेवटचा असल्याचे यातून निष्पन्न होते.
नृसिंह मुर्ती, मेहकर, बुलढाणा
मेहकर येथील (दृष्टांत) नृसिंह :-
केवल नृसिंह, रामटेक, नागपूर :-
नृसिंह मंदिर, पुसद, यवतमाळ :-
नरसिंह मंदिर, अंजी, यवतमाळ :-
नृसिंह मंदिर, जानोरी, बुलढाणा :-
महाराष्ट्रातील महत्वाच्या विष्णु मुर्ती
शारंगधर बालाजी मेहकर
या मुर्तीची सविस्तर माहिती घेण्यापुर्वी याचा इतिहास समजून घेउया.
जंबू द्वीप आणि भारतवर्ष या नावाने ओळखला जाणारा भारत हा इतिहासापेक्षा जुना आहे जोपर्यंत कला, इतिहास, पुरातत्व आणि धर्माचा संबंध आहे, तो प्रत्येकापेक्षा दुर्मिळ आणि अद्वितीय अशा अमूल्य रत्नांचा खरा खजिना आहे. या प्राचीन भूमीतील अशा दुर्मिळ आणि मौल्यवान खजिन्यांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील पेनगंगा नदीच्या काठावर मेहकर नावाचे एक महान पुरातन ठिकाण आहे. प्राचीन काळी ती मेघणकर नगरी म्हणून ओळखली जात होती आणि त्याचा उल्लेख स्कंद पुराण, पद्म पुराण, मत्स्य पुराण आणि आईन--अकबरी मध्ये आढळतो. नदीकाठच्या जंगलात अनेक ऋषी-मुनी राहत होते.
पौराणिक कथेनुसार, सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात, भगवान ब्रह्मदेवाने एक भव्य यज्ञ सुरू करताना आपल्या प्रणितपत्र’ वापरून पेनगंगा नदीची निर्मिती केली. या नदीत डुबकी मारणे आणि आपल्या दिवंगत नातेवाइकांचे श्राद्ध येथे करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या वनवासाच्या काळात प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता नाशिकजवळील पंचवटीला जाताना या भागात गेले. मेहकरमध्ये हरण टेकडी किंवा हिरण टेकडी नावाचे एक ठिकाण आहे, जिथे श्री रामाने हरणाची शिकार करून मारते असे म्हणतात. त्या जागेची खूण करण्यासाठी आता तिथे एक जीर्ण मंदिर आहे
मेघनकर नावाचा एक दैत्य या परिसरात राहत असे आणि ऋषींच्या यज्ञकुंडाना अपवित्र, करून आणि त्यांची हत्या करून खाऊन त्यांच्या कर्मकांडात आणि तपश्चर्यामध्ये गंभीर व्यत्यय आणत असे. ऋषीमुनी आणि ऋषींनी अनेक वर्षे भगवान हरीची त्यांच्या अत्याचारापासून सुटका करण्यासाठी प्रार्थना केली. स्थानिक पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या
प्रसिद्ध सारंग किंवा शारंगा धनुष्याचा वापर करून राक्षसाचा वध केला. असे असू शकते की स्वतः श्री रामानेच असुराचा वध केला होता ज्याप्रमाणे त्याने जंगलात प्रवास करताना इतर अनेकांना भारले होते. भगवान रामाचे धनुष्य सारंगा या नावानेही प्रसिद्ध आहे.मरणासन्न मेधनकरांच्या प्रार्थनेवर, परमेशराने त्या जागेचे नाव मेघनकर ठेवण्यास सहमती दर्शविली, जी नंतर मेहकरमध्ये बदलली गेली. कृतज्ञ साधु आणि मुनींनी परमेश्वराला त्याच्या चतुर्भुज स्वरुपात (चतुर्भुज विष्णु स्वरूप) राहण्यासाठी प्रार्थना केली, चक्र, गदा, पद्म आणि शेख यांसारख्या विविध प्रतीकांच्या विशिष्ट स्थानामुळे देवतेला बालाजी म्हणून ओळखले जाते
पण शारंगधर का? परमेश्वराच्या चार हातामध्ये धनुष्य दिसत नाही. याचे उत्तर असे की देवतेच्या मुकुटात शारंगा धनुष्य घरलेल्या भगवान विष्णूची बसलेली प्रतिमा आहे. शारंगधर बालाजीचे देवता ११.५ फूट उंच आहे आणि मंदिराच्या पुजाऱ्यानुसार गंडकी पाषाणाच्या एका स्लॅबमधून कोरलेले आहे. मराठीत पाषाण म्हणजे दगड गंडकी पाषाणचा अर्थ एकच आहे तो म्हणजे शालिग्राम शिळा कारण हे दगड नेपाळमधील गंडकी नदीत मोठया प्रमाणात आढळतात.

या मुर्तीच्या शोधाची कथाही काही कमी रोचक नाही. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १८९०, शुक्रवार म्हणजे ७ डिसेंबर १८८८ रोजी त्या छोट्या खेड्यात एक आश्चर्यजनक नि खळबळजनक घटना घडली. श्री. रामभाऊ भिते पाटील यांनी इमारती बांधण्यासाठी पाया खोदण्याचं काम सुरू केलं. मातीच्या खाली दगड अन् विटांचा थर लागला. तो दूर करण्याचं काम सुरू झालं. कुदळीच्या घावाबरोबर 'खण्ण' असा धातूचा आवाज आला. रामभाऊंनी काम थांबवलं अन् हातानं माती बाजूला सारली. खोदकाम करताना मजूराना एक मोठा लाकडी आयताकृती पेटी सापडली. त्या पेटीचा आकार पाहून ते थक्क झाले. ती १५ फूट लांब आणि अडीच फूट रुंद होती. हिरवा-निळा झालेला तांब्याचा तो पत्रा होता, येथे दगडावर कोरलेल्या बाणाचं टोक असलेल्या दिशेकडे खालच्या मूर्तीचं मस्तक होतं. दोन-अडीच सें.मी. जाडीचा अन् तब्बल पावणेदोन मीटर रुंदीचा हा तांब्याचा पत्रा होता. सर्वांना गुप्तधनाचीच शंका आली. पत्र्याखाली लाकडाचा (बहुदा चंदनाच्या लाकडाचा) भुसा होता. तो भुसा दूर करताचा काळ्याभोर चकचकीत पाषाणी मूर्तीची साजिरी पदचिन्हे आढळली. गावच्या प्रतिष्ठित मंडळींना बोलावून हळुवार हातानं मूर्ती मोकळी केली. शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेली श्रीविष्णूची प्रसन्न मूर्ती सर्वांना दिसली. भगवान विष्णूंची ती देखणी मूर्ती अप्रतिम सौंदर्याचा साक्षात नमुना होती. हिंदू दिनदर्शिकेनुसार ती होती मार्गशीर्ष शुक्ल पंचमी, शुक्रवार, श्रवण नक्षत्र, गोरज मुहूर्त, नाग दीपावली. छोट्या गावात ही बातमी वेगाने पसरली. .. देव निघाला म्हन्तात्...' करत आजूबाजूच्या गावांमधून हीऽऽ गर्दी जमली. हळद-कुंकवाचे सडे पडले, नगारा झडला अन् ग्रामजोशांनी- श्रीपत भटजींनी यथासांग पूजा केली. आरती झाली. साखर वाटली. गावात गढी, होतं सरकारी ठाणं मोगलाई गेली, अंगरेजी आल्यापासून मग बाहेर झाले बंगले, गढी वसान त्याजागी केल्या शाळा, सरकारनं ... केला वसरीचा आकार रामभाऊनं पाया खोदाय गेले लागल्या फरशा दोन दगडाचा जोड वर, खाली विटा संगिन .. काढला विटेचा थर, विटेखाली मलमा गीर जग लाविती कपाळाला, सुवास फार मग उघडी केली मूर्त, झाले सुर्त (श्रृत), अवघ्या नगरात झाले प्रभूचे दर्शन, उतरले आत असा झाला रयतेचा जमाव, माणूस मावेना एकूण एकावर लोटती, असा धिंगाणा आले मुलं लोकरं बाया, लागती चरणा बाकी इतर लोक म्हणती दर्शन लेना नाही मुंगी जायला रीघ देवदर्शना मेहेकरच्याच कडतुजी चव्हाण यांनी या घटनेचं वर्णन मोठ्या चपखलपणे आहे. या पोवाड्यात त्यांनी मूर्तीचं वर्णनही नेटक्या शब्दांत केलं आहे. केलं आहे.



शेंदूर्णीचा त्रिविक्रम विष्णु :-
वामन-दामोदर दूर्मिळ विष्णुमूर्ती
औंढा नागनाथचा केशव :-
श्रीधर विष्णु :
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्यात सध्या महादेवाची पिंड आहे.
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्यात सध्या महादेवाची पिंड आहे.
योगमुद्रेतील विष्णु :-
शिव-हरेश्वराची मुर्ती, होट्टल :-
मुख्य महादेव मंदिराचे चिरे, नक्षीदार २० खांब, बाह्यांगावरच्या सूरसूंदरींची शिल्पे, नृत्य गणेशाचे अप्रतिम शिल्प यांचा शोध घेवून मंदिराचे बांधकाम परत करण्यात आले. स्थानिक पाथरवटांचे सहकार्य घेत रिकाम्या जागी त्याच आकाराचे दगड कलात्मकरित्या बसविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या इनटॅक्ट (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड हेरिटेज) संस्थेच्या सहकार्याने गुरूतागद्दी सोहळ्याच्या निधीतून या कामासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला.
जिर्णाद्धार झालेली दोन मंदिरे पाहून एकीकडे पुरातन ठेव्याबद्दल अभिमान वाटत असतानाच समोर येते दुसरे भग्न मंदिर जमिनीखाली अर्धे गाडले गेलेले हे मंदिर आपल्या शिल्पवैभवाने एकीकडे पाहणार्याचे डोळ्याचे पारणे फेडते आणि परिसराची दुर्दशा बघून डोळ्यात पाणीही आणते.
मंदिराच्या परिसरांत कित्येक शिल्पे विखुरलेली आहेत. काही शिल्पांभोवती उकिरडा साठला आहे. प्रातर्विधीसाठी लोक या जागेचा वापर करताना पाहून त्याच दगडांवर डोके आपटून घ्यावे अशी भावना दाटून येते. मंदिर परिसरांत दगडी बांधकाम असलेली बारव आहे. तिथे प्रचंड झाडी गवत वाढले आहे. पाण्याचा उपसा नसल्याने हिरवट शेवाळ्याचा थर साचला आहे. गाळ प्रचंड असल्याने पाण्याला दुर्गंधी येते आहे. निगराणी अभावी दगडी चिरे ढासळून गेले आहेत.
पुरातत्व विभाग काय करतो आहे? किंवा लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी काय करत आहेत? या सोबतच आधी सामान्य नागरिक म्हणून आपण या पुरातत्वीय महत्त्वाच्या ठेव्याची अशी अवहेलना का करतो आहोत? हा प्रश्न सतावतो. या मंदिराच्या परिसराची किमान साफसफाई, कुंपण घालून त्याचे संरक्षण इतकी साधी गोष्ट आपणाला का जमत नाही?
एक शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती गावात नालीच्या कडेला पडून आहे. हत्तीचे सुंदर शिल्प उकिरड्यावर लोळत आहे. होट्टल महोत्सव पाहण्यासाठी आलेला व्हिन्सेंट पास्किलीनी हा परदेशी फ्रेंच प्रवासी उपहासाने म्हणाला, ‘तूम्ही भारतीय इतके श्रीमंत अहात की अप्रतिम अशी शिल्पे तूम्ही उकिरड्यार फेकून देता.’ आता या उद्गारावर काय प्रतिक्रिया द्यावी?
ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे तेथपासून ते जमिनीत गाडल्या गेलेल्या दुसर्या मंदिरापर्यंत सरळ असा दगडी मार्ग असल्याचे अभ्यासक सांगतात. रस्त्यात असलेल्या मानवी वस्तीचे अतिक्रमण काढले तर हा संपूर्ण मार्ग दृष्टीपथास येवू शकतो.
आजही दगडी काम करणारे कारागीर येथे आहेत. त्यांची काम करण्याची तयारी आहे. त्यांचा तो पोटपाण्याचा उद्योग असल्याने गरजही आहे. मग या पाथरवटांच्या साहाय्याने ही कामं आपण का नाही मार्गी लावू शकत? निवेदनं द्या, प्रस्ताव तयार करा, मग सरकारी पातळीवर हालचाली होणार, सरकारी पातळीवरची उदासीनता हे सगळं असह्य आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाण जेंव्हा येईल तेंव्हा येईल पण आधी किमान आपण स्थानिक पातळीवर शक्य होईल ते काम केले पाहिजे. त्यासाठी गावकर्यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे. मंदिरांचा जिर्णोद्धार, परिसराची स्वच्छता, होट्टल पर्यंत येण्यासाठी पक्क्या चांगल्या रस्त्याचे निर्माण यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती होईल.
हरी—हर जूळ्या मुर्ती (वडगल्ली, परभणी) :-
जबरेश्वर महादेव मंदिरात नंदीच्या पाठीमागे या दोन मुर्ती कोनाड्यात ठेवलेल्या आहेत. मंदिर संपूर्ण नविन झालं आहे. पूर्वी मंदिरा समोर बारव होती ती आता बुजवल्या गेली. या दोन मुर्ती मुळ मुख्य मंदिरात कुठे बसवलेल्या असतील हे आता कळत नाही पण त्यांच्या एकसारख्या शैलीमुळे अगदी आजूबाजूला असतील हे सहज लक्षात येतं. जी महादेवाची पिंड आता गाभार्यात आहे ती स्वयंभु असून मंदिराची दूरूस्ती ६० वर्षांपूर्वी झाली तेंव्हा पिंड काढताच आली नाही. प्रचंड मोठ्या शिळेचा ती भाग होती. मग तिच्यावर आच्छादन टाकुनच दूरुस्ती केल्या गेली अशी लहानपणीची आठवण आई सांगते (आईचा जन्म १९४९). गाभार्यात हनुमानाची स्थापना भिंतीवर केली आहे. पण ही मुळ मुर्ती नसणार. मुळात हे जबरेश्वर (शिव) आणि जगदीश्वर (विष्णु) असे मंदिर असेल का? कारण या मुर्ती मंदिराच्या बाह्य भागातील वाटत नाही.
अनंतशयन विष्णु :-
पैठणच्या नृसिंह मंदिरातील ही देखणी मुर्ती. शेषशय्येवर विष्णु पहूडले आहेत. झोपले हा शब्द आपण चुकीने वापरतो, उजवा वरचा हात माने खाली घेतल्याने मान उंचावली आहे. ही अगदी नैसर्गिक सहज अशी अवस्था शिल्पकाराने रेखली आहे. नाभीतून निघालेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत. लक्ष्मी उजवा पाय चेपत आहे. डावा पाय घडी करून कासवाच्या पाठीवर टेकवला आहे. मुर्तीच्या पाठशिळेवर नक्षीत दहा अवतार कोरलेले आहे. शेषाचा फणा बरोबर चेहर्याला मध्यभागी कल्पुन समतोल साधत शिल्पांकीत केलेला दिसतो.
अनंतशयन विष्णु
अनंतशयन असा हा अप्रतिम विष्णु मंदिराच्या बाह्य भागावर कुठे सहसा आढळत नाही. ही मूर्ती परभणीच्या क्रांती चौकातील राम मंदिरात आहे (टाकळकर कुटूंबियांचे हे मंदिर आहे).उजव्या वरच्या हातावर मस्तक विसावलेले आहे. उजव्या पायाशी लक्ष्मी असून ती पाय चुरत आहे (याला पाय दाबणे म्हणत नाहीत). तिच्या बाजूला भुदेवी हात जोडून उभी आहे. नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. पाठशिळेवर दहा अवतार कोरलेले आहेत. खाली नागाच्या वेटोळ्यांची मउ शय्या आहे. डोक्याशी नागाचा फणा आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पाठशिळेवर कोरलेले अष्टदिक्पाल. कंसात दिशा आणि वाहन दिले आहेत. इंद्र (पूर्व -ऐरावत)), अग्नी (अग्न-मेष) , यम (दक्षिण-महिष), निऋती (नैऋत्य-श्वान), वरूण (पश्चिम-मकर), वायु (वायव्य-मृग), कुबेर (उत्तर- नरवाहन) , ईशान (ईशान्य-वृष). शिल्पात त्यांची वाहने पण दाखवली आहेत. अभ्यासक या शिल्पाला फार महत्वाचे मानतात त्याचे कारणच ही वैशिष्ट्ये आहेत. बारवेत अशा शिल्पाची स्थापना केलेली असते.
शेषशायी विष्णु आणि समुद्रमंथन :-
ज्याठिकाणी बारवा, कुंड, पुष्करणी आहेत अशा जागी शेषशायी विष्णुचे शिल्प कोरलेले आढळून येते. हे शिल्प सहसा मंदिरावर नसते. मराठवाड्यातील प्राचीन बारवांमध्ये अशी शिल्पे आढळून आलेली आहेत. यातही हे शिल्प अजून वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या ठिकाणी समुद्रमंथनाचा देखावा शिल्पांकित केला आहे. गोसावी पिंपळगांव (ता. सेलु, जि. परभणी) येथील दूर्लक्षीत असे प्राचीन मंदिर, तेथील बारव या परिसरांत आमचे भटके पुरातत्व प्रेमी मित्र मल्हारीकांत देशमुख यांना हे शिल्प आढळून आले. शेषशायी शिल्पांवर दशावतार कोरलेले असतात, अष्टदिक्पालांच्या प्रतिमा असतात. पण इथे समुद्र मंथनाचा प्रसंग कोरलेला आहे.विष्णुचे पाय चुरणारी लक्ष्मी दिसत नाही. तो भाग भंगला आहे. बाकी शंख, चक्र, गदा ही आयुधं स्पष्टपणे ओळखु येतात.
असा शिल्पखजिना गावोगाव विखुरला आहे. गोसावी पिंपळगाव हे अडवळणाचे गाव. गावकर्यांनी मंदिर परिसर चांगला जपला आहे. अभ्यासकांनी अशा शिल्पांचा सविस्तर अभ्यास करून त्यांना प्रकाशात आणले पाहिजे. यातील शास्त्रीय बारकावे समोर आले पाहिजेत. ही विखुरलेली शिल्पे जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र आणून त्यांचे संग्रहालय झाले पाहिजे.
परभणी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील अभ्यासक, पुरातत्व प्रेमी, सामाजीक कार्यकर्ते यांची एक समिती नेमून या कामाला गती दिली आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती :-
विष्णुच्या हातातील गदा स्पष्ट दिसते. दूसर्या हातात काय आहे स्पष्ट दिसत नाही. विष्णुचा लक्ष्मीच्या कमरेवरचा डावा हात आणि लक्ष्मीचा विष्णुच्या खांद्यावरचा उजवा हात दिसतो. लक्ष्मीची उंचावलेली मान. तिच्या डाव्या हातात कमळाची कळी आहे. विष्णुला सखा मित्र सोबती मानणारी ही मूद्रा फार मोहक आहे. विष्णुचा उजवा पाय गुडघ्यात जरा वाकला आहे. लक्ष्मीचा डावा पाय असाच गुडघ्यात वाकुन मग खाली आला आहे. हा पाय भंगला असून परत खाली तळव्यापाशी जरा दिसतो आहे. तिच्या कानातले वर्तूळाकार कुंडल आणि त्यात परत एक फुल मोठं मोहक आहे. विष्णुच्या बाजूने खाली गरूड हात जोडून मांडी टेकवून बसला आहे. त्याचे पंख मागे दिसत आहेत.
आपल्याकडे "लक्ष्मी नारायणा" सारखा जोडा म्हणायची पद्धत आहे. या म्हणीचं हजार वर्षांपूर्वीचे हे शिल्पांकित देखणं दृश्यरूप. इथे दोघांची उंचीही जवळपास समान दाखवली आहे. विष्णु जरासा डावीकडे झुकलेला आणि लक्ष्मीही त्या बाजूने जराशी झुकलेली आहे. अतिशय लालित्यपूर्ण अशी ही मूद्रा आहे. त्याचा डावा आणि तिचा उजवा पाय ठामपणे जमिनीवर रोवलेले आहेत. तर विष्णुच्या उजवा तळव्याची बोटंच जमिनीवर टेकतात. लक्ष्मीचा डावा तळवाही असाच अधर आहे. चार पैकी दोन पाय भक्कम आणि बाकी दोन ललित या कल्पनेला दाद दिली पाहिजे. सुखी संसाराचे रहस्यच शिल्पकाराने मांडलय.
दोघांचेही चेहरे समोर असले असते तर हे शिल्प सपाट वाटले असते. पण लक्ष्मीच्या संपूर्ण मूर्तीला ३० अंशाचा जरासा कोन देवून शिल्पकाराने जो ३ डि परिणाम साधलाय त्याला तोड नाही. कमाल आहे.
लक्ष्मी नारायणाच्या स्थानक मूर्ती (उभ्या असलेल्या) फार कमी आहेत. याच मंदिरावर अशी अजून एक मूर्ती आहे. लोणारला दैत्यसुदन मंदिरावर पण एक आहे. पण ही सर्वात लालित्यपूर्ण.
विष्णुची वराह मूर्ती :-
वेरूळ लेण्यातील वराह अवतार शिल्प :-
बालाजी मूर्ती :-
ही सुंदर बालाजी मूर्ती चपळगावकर घराण्याची कुलदेवता आहे. कर्नाटका सीमेवर चपळगावकर ह्यांचे मूळ गाव आहे. वैष्णव कुटुंबात बालाजी कुलदैवत असते. विष्णूची नेमकी कोणती मूर्ती बालाजी व्यंकटेश ह्या नावाने संबोधली जाते? तर उजव्या वरील हातात चक्र वरील डाव्या हातात शंख, खालील उजवा हात वरद मुद्रेत आणि खालील डावा हात कटीवर. पुरीचा जग्गनाथ, तिरुपतीचा बालाजी आणि पंढरपूरचा विठ्ठल ही तीन मुळचे लोक दैवते. जग्गनाथ "अन्न ब्रह्म", बालाजी "कांचन ब्रह्म" आणि विठ्ठल "नाद ब्रह्म" म्हणून ओळखले जातात. व्यंकटेश बालाजीची आतिशय सुंदर आरती समर्थ रामदास यांनी रचिली आहे. ती बऱ्याच जणांना माहित नाही. इथे देत आहे. रा. चिं. ढेरे यांनी "श्रीव्यंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर" या आपल्या पुस्तकात दिली आहे. देवीचे नवरात्र असतात त्याच वेळी बालाजीचे ही नवरात्र असतात. त्याला ब्रह्मोत्सव म्हटले जाते. बालाजी आणि पद्ममावती विवाह सोहळाही ह्या काळात लावले जाते.
जय देव जय देव जय व्यंकटेशाआरती ओवाळू तुज रे जगदीशा ॥ धृ०||
अघहरणी पुष्करिणी अगणित गुणखाणी ।
अगाध महिमा स्तवितां न बोलवे वाणी ॥
असंख्य तीर्थावळी अचपळ सुखदानी ।
अभिनव रचना पहातां तन्मयता नयनीं ॥ १ ||
अतिसुखमय देवालय, आलय मोक्षाचे ।
नाना नाटक रचना, हाटक वर्णाचे ॥
थकित मानस पाहे स्थळ भगवंताचे ।
तुळणा नाही हे भू-वैकुंठ साचे ॥ २ ||
दिव्यांबरधर सुंदर तनु कोमल लीळा ।
नाना रत्ने, नाना सुमनांच्या माळा ॥
नानाभूषणमंडित वामांगी बाळा ।
नाना वाद्ये मिनला दासांचा मेळा ॥ ३||
विठ्ठल मुर्ती :-
तुकाराम महाराजांनी "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" अशी ओळ ज्याच्याकडे पाहूनच लिहिली असावी अशी ही सुंदर विठ्ठल मुर्ती. सिंधुरवदन गणेशामुळे सर्व परिचित असलेल्या खाम नदीकाठच्या शेंदूरवादा (ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर ) या गावात एका छोट्या लाकडी माळवदाच्या वाडा वजा मंदिरात ही मुर्ती ठेवलेली आहे. शिवकालीन संत मध्वमुनीश्वरांचे हे ठिकाण. इथे त्यांची समाधी आहे. जहागीरदार कुटूंबियांनी मध्वमुनीश्वरांचा आश्रम नक्षीदार कमानी दगडी ओवर्या असा भव्य बांधुन काढला आहे.
मध्वमुनीश्वर नियमित पंढरपुरची वारी करायचे. शरिर थकल्यावर त्यांनी विठ्ठलाला पत्र लिहिलं आणि येणं शक्य नाही असं म्हणत इथूनच नमस्कार केला. मग विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देवून मीच तूझ्याकडे येतो असं सांगितले. तीच ही विठ्ठल मुर्ती. दरवर्षी मध्वमुनीश्वरांचा उत्सव साजरा होतो तेंव्हा ही मुर्ती मिरवणुकीने मध्वमुशीश्वर आश्रमात नेली जाते.
समचरण कर कटीवर ठेवलेले अशी ही काळ्या पाषाणातील देखणी मुर्ती. याच मंदिरात गरूडाचीही छोटी मुर्ती आहे. विठ्ठलाच्या प्राचीन सुबक देखण्या मुर्ती फार थोड्या आहेत. आणि ज्या आहेत त्या काहीश्या ओबडधोबड. शिवाय प्राचीन अशी विठ्ठलाची मंदिरेही फारशी नाहीत. पंढरपुर शिवाय पानगांव (ता. रेणापुर जि. लातुर) हाच एक ठळक अपवाद. हे प्राचीन विठ्ठल मंदिर शिल्प सौंदर्याने नटलेले आहे.
विठ्ठलाची मुर्ती एकटीच असते. सोबत रूक्मिणी नसते. अगदी पंढरपुरलाही रूक्मिणी मंदिर वेगळे आहे. यावर अरूण कोलटकर यांची वामांगी नावाची अप्रतिम कविता आहे. नंतरच्या काळात विठ्ठल रूक्मिणी यांच्या मुर्ती एकत्र तयार केल्या जायला लागल्या. या विठ्ठल मुर्तीचे पाय अतिशय देखणे आहेत. "पायावर डोकं ठेवणं" याला वारकरी संप्रदायात वेगळे महत्व आहे.
एकनाथांचा विजय विठ्ठल
कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात तर आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीनंतर देव निद्राधीन होतात. बरोबर ४ महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला त्यांची निद्रा पूर्ण होते. हे चार महिने संत विद्वान अभ्यासक मंडळी पंढरपुरातच मुक्काम ठोकून ग्रंथांवर कुटचर्चा विचारविनिमय अभ्यास प्रवचन करतात.विजय विठ्ठल (हंपी, कर्नाटक)
पंचेवीस तीस फुटीं उंच सलग असे दगडी खांब आणि तसलेच आडवे बीम वापरून जी भव्यता हंपीच्या मंदिरांना आलेली आहे ती विलक्षण आहे. अन्यथा इतक्या लांबीचे दगड कुठल्या जुन्या मंदिरामध्ये वापरलेले आढळत नाहीत. मंदिरातला गरूड खांब, हा भव्य रथ विठ्ठल विष्णुचाच अवतार समजला जातो याचा पुरावा दाखवतो. रथयात्रा ही प्रामुख्याने वैष्णव देवतांची निघते. महाराष्ट्राने पालखी हा रथाला शोधलेला वेगळा वैशिष्ट्यपूर्ण पर्याय आहे का? याचाही शोध घेतला पाहिजे. विठ्ठल हे दैवतच मुळात सनातन धर्मातील एक क्रांती आहे असं जाणवतं. या दैवतेला वाहन नाही, हीच्या हातात शस्त्र नाही, ही दैवता कोप पावून कुणाला शाप देत नाही की वरदान देत नाही. पुंडलीकाने फेकलेल्या वीटेवर कटीवर हात ठेवून उभी आहे. त्यामुळे भजनात रमलेला तुळशी माळ घातलेल्या वारकर्याच्या भोळ्या भक्तीत बुडालेला विठ्ठलच आपल्याला जवळचा वाटतो. विजयनगरचा विजय विठ्ठल अंतराने आणि रूपानेही दूरचा भासतो. आपल्याला काळ्या पाषाणातील विठ्ठलाचे "सावळे सुंदर" रूप पहायची सवय. त्यामुळे हा विठ्ठल वेगळा वाटतो. कुठे संगमरवरी दगडांत कुणी विठ्ठलाची मुर्ती घडवली तर मला नाही वाटत ती मराठी माणसाला आपलिशी वाटेल म्हणून. बहिणाबाईंनी त्यामुळेच लिहून ठेवलंय
सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्याचा विठोबा
पाना फुलांतच राजी
रा.चिं. ढेरे सारख्या अभ्यासकाने मांडले की पुरीचा जग्गनाथ, तिरूपतीचा बालाजी आणि पंढरपुरचा विठोबा ही मुळची लोकदैवतं नंतर विष्णुचे अवतार म्हणून स्विकारली गेली. जग्गनाथ "अन्नब्रह्म", बालाजी "कांचनब्रह्म" तर विठ्ठल "नादब्रह्म" मानल्या जातो. तुळशीमाळ गळ्यात घातलेला विठ्ठल आर्तपणे आळवलेल्या भजनानेच संतुष्ट होतो.
हरीहरात्मक रुक्मिणी पांडुरंग मूर्ती, वेरूळ !
आता सर्वप्रथम मूर्तीची माहिती आणि थोडासा इतिहास समजून घेऊया. ही मूर्ती वेरूळ इथल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी घृष्णेश्वर मंदिराच्या एक किलोमीटरच्या अंतरावर टोपरे कुटुंबीयांच्या घराजवळ सुप्रतिष्ठित आहे. मूर्तीच्या दैनिक पूजेचे आणि सेवेचे सौभाग्य टोपरे कुटुंब गेली सातशे वर्ष सांभाळत आहेत. ही मूर्ती तिथे कशी आली याबद्दलची कथा त्यांच्याकडूनच ऐकायला मिळाली ती खालील प्रमाणे :
खूप पूर्वी सातशे वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला जमीन नांगरताना जमिनीत काहीतरी अडलं आणि काय आहे हे बघायला गेला तर जमिनीतून रक्ताची धार निघत असताना त्याला दिसलं. आजूबाजूची जमीन खणून मोकळी केल्यावर त्याला सदर मूर्ती नजरेस पडली. त्यावेळेस त्या गावांमध्ये मल्हार स्वामी म्हणून एक महाराज तपश्चर्या करत होते. शेतकऱ्याने त्यांना भेटून विनंती केली की मला शेतामध्ये नांगरताना अशी मूर्ती सापडली आहे आणि माझ्याकडनं तर तिची पूजा अर्चा होणे शक्य नाही तर तिला तुमच्या सानिध्यात आणून ठेवतो जेणेकरून तिची दैनिक पूजाअर्चा करणे सोपे होईल. महाराजांनी संमती दिली आणि शेतकऱ्याने त्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या गाडीवरती दोन बैल लावले आणि त्यावर ती मूर्ती उचलून ठेवली. पण दोन बैलांनी ती मूर्ती पुढे खेचली जाईना तेव्हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे चार बैल आठ बैल असं करत करत बऱ्याच बैलांची शक्ती वापरूनही ती मूर्ती काही हलेना. शेवटी परत महाराजांकडे येऊन त्या शेतकऱ्यांनी प्रसंग कथन केला आणि त्यांना शेतात येण्याची विनंती केली. महाराज मूर्ती सापडलेल्या शेतात आले आणि त्यांनी मूर्तीला हात जोडले आणि सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत चला. बाकी शेतकऱ्यांनी ती मूर्ती उचलून महाराजांच्या डाव्या खांद्यावर दिली आणि इतकी प्रचंड मूर्ती महाराजांनी एकट्याने उचलून त्यांच्या मठाजवळ आणून सुप्रतिष्ठित केली. नांगरताना झालेल्या जखमेचा व्रण आजही या मूर्तीवर दिसून येतो. सातशे वर्षांपूर्वी शेतात सापडली म्हणजे या मूर्तीचा मूळ किती जुना असेल यासाठी कल्पनेचाच आधार घ्यावा लागेल !हरिहरात्मक रुक्मीणी पांडुरंग
मूर्तीबद्दल विवेचन करायचं झाल्यास तिचं नाव हरिहरात्मक रुक्मिणी पांडुरंग का असावं तर ह्याची दोन कारणं, एक म्हणजे मल्हार स्वामी यांनी स्वतः हे नाव या मूर्तीला दिलं आणि मूर्तीचे अलंकार त्याची आयुधं या सगळ्याचा विचार केला तर यामध्ये शंकर आणि विष्णूची आयुधं आढळून येतात. मूर्ती अष्टभुजा म्हणजे आठ हातांची आहे. प्रत्येक हातात आठ वेगवेगळी आयुधं दिसून येतात.
विष्णूच्या आयुधांबद्दल :
विष्णूची आयुधं म्हणजे शंख चक्र गदा आणि कमळ. मूर्तीच्या उजव्या हातात गदा आणि कमळ आढळून येतात. गदा भलीमोठी असून त्यावर किर्तीमुख आणि मारुती कोरलेला दिसतो. मूर्तीच्या डाव्या हातात शंख आणि चक्र आढळते. शंखाच्या बनावटीवरून तो पांचजन्य शंख असल्याचे अंकित होते. पांडुरंगाच्या हातातही शंख दिसतो त्या अनुषंगाने ही पांडूरंगाची मूर्ती असल्याचा अंदाज बांधता येतो.
शंकराच्या आयुधांबद्दल :
ह्या मूर्तीत शंकराची काही आयुधं आहेत पण ती सुस्पष्ट नाहीत. मूर्तीच्या उजव्या हातात सर्वात वरती तलवार / खड्ग सदृश्य आयुध तर उजव्या हातात पाठच्या बाजूला भाल्या सदृश्य आयुध आढळतं. डाव्या हातात वरच्या बाजूला टंक ( दोन्ही बाजूला त्रिशूळ ) सदृश्य आयुध दिसतं तर डाव्या हातात (शंखाच्या वरच्या बाजूस ) सर्प पकडलेला दिसतो. खड्ग, सर्प आणि टंक ह्या आयुधावरून शंकराची मूर्ती असल्याचा संदर्भ देता येतो.
बाकी मूर्तीला रुक्मीणी का म्हणतात हे मल्हार स्वामींनाच ठाऊक.
बाकी एकंदर मूर्ती अत्यंत सुबक, आखीव रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. हातात अंगठ्या, बाजूबंद इत्यादी अलंकार सुंदर कोरले आहेत. दगडावर वज्रलेप केला असल्यामुळे दगडाचा पोत ( texture ) कळू शकला नाही पण मूर्तीची प्राचीनता पाहून तिच्यावर होयसळ कलेची छाप असवी हे नक्की !
पुण्यातील विष्णू मंदिरे -
१) नवा विष्णू मंदिर - बाजीराव रस्त्यावर शनिपाराजवळ नातूबागेपाशी नवा विष्णू मंदीर आहे. सार्वजनिक काका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जोशी कुटुंबियांच्या मालकीचे हे मंदिर आहे.
२) बिजवर विष्णू मंदिर - शनिवार पेठेत वीर मारूतीशेजारी बापट कुटुंबियांच्या मालकीचे छोटे विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर १८३८ मध्ये स्थापन झाले.
३) कसबा गणपती मंदिराशेजारील केदारेश्वर बोळात पौरोहित्य करणाऱ्या कानडे कुटुंबियांचे खासगी विष्णू मंदिर आहे. हे मंदिर त्यांनी १९७४ मध्ये स्थापन केले.
४) शनिवार पेठेत रमणबाग चौकात माणकेश्वर विष्णू मंदिर आहे.
५) २९१, सोमवार पेठ येथे एक विष्णू मंदिर आहे.
६) लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग विष्णू मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे.
७) पर्वती टेकडीवर एक विष्णू मंदिर आहे.
८) पु. लं. च्या काही लेखात पुण्यात बायकी विष्णू मंदिर आहे असा उल्लेख आहे. याचा संदर्भ सापडत नाही.
विष्णुची शक्तीरूपे :-
विष्णुचे शक्तीरूप - लक्ष्मी :-
हातातील आयुधे शंख चक्र गदा आणि पद्म यांचा जो क्रम आहे त्यानुसार विष्णुची २४ नावं आहेत. या २४ नावांसाठी २४ शक्ती आहेत. यातील उजव्या बाजूने म्हणजेच प्रदक्षिणा क्रमाने गदा, शंख, चक्र आणि डाव्या खालच्या हातात पद्म अशा विष्णुला वासुदेव संबोधले जाते. या छायाचित्रात याच क्रमाने आयुधे धारण केलेली जी स्त्री प्रतिमा आहे तीला लक्ष्मी असे संबोधले जाते (देवता म्हणून असलेली लक्ष्मी मूर्ती वेगळी). या मूर्तीचे शास्त्रा प्रमाणे केलेले विश्लेषण वेगळे. पण एक ललित कलाकृती म्हणूनही ही लोभस वाटते. उजवा हात ज्या पद्धतीने गदेवर टेकवला आहे, त्याचे लालित्य आणि गदेच्या सरळपणावर तोललेला सर्व शरिराचा भार, दूमडलेला उजवा पाय आणि रोवलेला तिरका डावा पाय, कमरेपासूनचे वरचे सर्व शरिर ९० अंशात फिरवून समोर आणले आहे जेंव्हा की पायाची दिशा वेगळी आहे. गदेच्या वरच्या टोकावर टेकवलेला पंजा हाच संपूर्ण शिल्पाचा तोल सांभाळणारा मध्यबिंदू जाणवतो.विष्णुचे शक्तीरूप - शांती :-
सोबतच्या छायाचित्रात जे शक्तीरूप आहे त्याच्या हातातील आयुधांचा क्रम उजव्या खालच्या हातात चक्र, वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात पद्म आणि डाव्या खालच्या हातात गदा असा आहे. अशा विष्णुला मधुसूदन संबोधले जाते. मधुसूदन विष्णुच्या या शक्तीरूपाला शांती म्हणतात. (देगलुरकरांच्या पुस्तकांत santi असे लिहिले आहे. सांती असाही याचा उच्चार होतो. शास्त्राप्रमाणे मुर्ती कोरल्यावर शिल्पकाराने पुढे जावून जो कलाविष्कार घडवला आहे तो विलक्षण आहे. चक्र असलेला हात आणि गदेवरचा हात यात नृत्याची मुद्रा वाटावी असा समतोल आहे. शंख व पद्म धारण केलेल्या हातांची बोटे विलक्षण कलात्मक अशी वळवलेली आहेत. दोन्ही पाय दूमडलेले वक्राकार आहेत. डाव्या पायाचा तळवा संपूर्ण मुडपून समोरच्या बाजूला दिसतो आहे. गदाही सरळ नसून तिरपी आहे. कानातील कुंडले चक्राच्या आकाराची आहेत. गळ्यात एक हार मानेजवळ तर दूसरा दोन वक्षांच्या मधुन कलात्मकरित्या खाली ओघळला आहे. ठाम सरळ रेषा शिल्पात कुठेच नाही. अगदी बाजूच्या नक्षीतही नाही. मुर्तीच्या बाजूचे दोन उभे भक्कम स्तंभ जन्म आणि मृत्युचे प्रतिक मानले तर बाकी सगळ्याच शिल्पात लालित्य भरून राहिले आहे. कदाचित जन्म आणि मृत्यु या दोन बिंदूमध्य लालित्यपूर्ण आयुष्य जगले तर "शांती" लाभते असंही शिल्पकाराला सुचवायचे असेल.विष्णुची शक्ती रूपे - सरस्वती :-
अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावर विष्णुची शक्तीरूपे शिल्पांकीत आहेत. छायाचित्रातील मूर्तीच्या हातात प्रदक्षिणा क्रमाने (डावीकडून उजवीकडे, घड्याळ्याच्या काट्या प्रमाणे) गदा, शंख, पद्म आणि चक्र अशी आहेत. या विष्णुला संकर्षण म्हणून संबोधले जाते. प्रतिभाशक्ती किंवा वाणी ही संकर्षण विष्णुची वैशिष्ट्ये मानली जातात. स्वाभाविकच या विष्णुची जी शक्ती आहे तिला सरस्वती हे नाव आहे. वीणा पुस्तक धारिणी म्हणून ज्या सरस्वती देवतेची पुजा होते ती सरस्वती वेगळी. ही केवळ शक्ती रूप आहे. या शक्तीच्या चेहर्यावर शांत भाव आहेत. प्रतिभेच्या पाठिशी बळ असावे लागते. नुसती दूबळी प्रतिभा कामाची ठरत नाही. संकर्षण विष्णुला बलाची देवता मानले जाते. साहजिकच त्याची शक्ती असलेली सरस्वतीही सामर्थ्यवान समजली जाते. ज्या प्रतिभेच्या पाठिशी सामर्थ्य आहे तिथे स्थिरता येते. आणि त्या स्थिरतेतून समाधान. म्हणूनच ही मुर्तीच्या चेहर्यावरील भाव शांत समाधानी दिसून येतात.आग्नेय आशियातील विष्णुमूर्ती...
- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com
आग्नेय आशियामध्ये शंकरासोबतच विष्णूची उपासना किमान दीड हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती, हे तेथील शिलालेख आणि मूर्तींच्या पुराव्यांवरून लक्षात येते. त्यातील काही मोजक्या आणि महत्त्वाच्या मूर्तींची ओळख आजच्या लेखात करून घेणार आहोत.
आपल्या देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कुशाण राजवंशाच्या काळातील (आजपासून सतराशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती आढळलेल्या आहेत. त्यानंतर आलेल्या गुप्त राजवंशाच्या काळातील (आजपासून सोळाशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती मध्य प्रदेशातील उदयगिरी लेण्यांत किंवा मथुरा इथे सापडल्या आहेत. या आपल्या देशातल्या प्राचीन विष्णुमूर्ती आहेत. याच काळात शैव आणि वैष्णव पंथ आताच्या भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून आग्नेय आशियातील थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये पोहोचले. भूतलावरील राजा हा सृष्टीचे पालनपोषण करणाऱ्या विष्णुसमान किंवा विष्णूचा अवतार आहे ही भारतीय संकल्पनासुद्धा आग्नेय आशियातील या देशांमध्ये दिसून येते.
थायलंड : आग्नेय आशियात सापडणाऱ्या सर्वांत प्राचीन विष्णुमूर्तींपैकी एक विष्णुमूर्ती आपल्याला थायलंडमध्ये सापडते. दक्षिण थायलंडमधील चैय्या इथे सापडलेली ही विष्णुमूर्ती भारतातील कुशाण आणि गुप्त राजवंशाच्या काळातील मूर्तींशी साम्य दाखवणारी आहे. इसवीसन चौथ्या/पाचव्या शतकात म्हणजे आजपासून सोळाशे ते पंधराशे वर्षांपूर्वी ही मूर्ती तयार करण्यात आली होती.
ही मूर्ती चतुर्भुज विष्णूची आहे. या मूर्तीत विष्णूच्या मस्तकावर किरीट असून कानात मोठी कुंडलं आहेत. मूर्तीचा मागील डावा हात तुटलेला असून मागील उजव्या हाताने गदा धरलेली आहे. पुढील उजवा हात अभय मुद्रेत असून पुढील डाव्या हातात शंख धरलेला आहे. अशा पद्धतीने कमरेपाशी शंख धरलेल्या भारतातील कुशाण राजवंशाच्या आणि गुप्त राजवंशाच्या काळातील विष्णुमूर्ती उत्तर भारतात आढळून आलेल्या आहेत.
काही अभ्यासकांच्या मतानुसार चैया येथील ही विष्णुमूर्ती म्हणजे आग्नेय आशियातील आता उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन विष्णूमूर्ती आहे. इसवीसनाचे चौथे शतक किंवा पाचवे शतक या दरम्यानच्या कोणत्या काळात ही मूर्ती घडवण्यात आली असावी, याबद्दल अभ्यासकांत मतमतांतरे आहेत. काही असले तरी भारतातील विष्णुमूर्तीचा प्रचंड प्रभाव असणारी ही आग्नेय आशियातील महत्त्वाची मूर्ती आहे, हे नक्की. याशिवाय थायलंडमध्ये इतरही अनेक ठिकाणी विष्णूमूर्ती सापडल्या आहेत. थायलंडमधील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील तेथील शैव आणि वैष्णव पंथांचा प्रभाव तेथील हिंदू मंदिरे आणि देवतांच्या मूर्तींवरून लक्षात येतो.
कंबोडिया : कंबोडियातील सोळाशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखांतूनसुद्धा विष्णुमंदिरांना दिलेली दानं नमूद केलेली आहेत. त्या काळातील काही विष्णुमूर्तीदेखील सापडल्या आहेत. मात्र विष्णुभक्तीचा कळस आपल्याला अंकोरवाट नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मंदिरात बघायला मिळतो. हे मंदिर कंबोडियातील सूर्यवर्मन (दुसरा) या राजाने बाराव्या शतकात बांधलं. तेथील शिलालेखांत या राजाचे नाव परमविष्णुलोक असे नोंदलेले आहे. या मंदिरातील समुद्रमंथनाचे शिल्प अत्यंत प्रसिद्ध आहे. समुद्रमंथनाच्या या शिल्पात कुर्मावतारासह विष्णूची मूर्तीदेखील पहायला मिळते.
या मंदिराशिवाय अंकोरच्या परिसरात थोम्मानन, बांते सम्रे इत्यादी विष्णुमंदिरं आढळून येतात. या सर्व मंदिरांवरील शिल्पांमध्ये आपल्याला विष्णू, राम, कृष्ण यांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधित कथांची शिल्पं कोरलेली आढळतात. कंबोडियामध्ये विष्णूच्या दगडी शिल्पांखेरीज ब्राँझच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत. यातील आठशे वर्षांपूर्वीची गरुडारूढ विष्णूची एक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. कंबोडियातील अनेक मंदिरांच्या भिंतीवर आढळणाऱ्या गरुडारूढ विष्णूच्या दगडी मूर्तींसमान ही ब्राँझची मूर्ती घडवलेली आहे.
व्हिएतनाम : मध्य आणि दक्षिण कंबोडियातील वैष्णव पंथाचा प्रभाव व्हिएतनाममध्येदेखील पडला होता. त्यामुळे व्हिएतनाममध्येदेखील इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून विष्णुमूर्ती निर्माण केल्या जात होत्या. येथील एका विष्णुमूर्तीच्या वरील दोन हातांत शंख आणि चक्र दिसून येते. तर खालील डावा हात हा गदेवर ठेवलेला आहे. या मूर्तीत विष्णूचे कुरळे केस दाखवले असून मस्तकावर किरीट आहे.
ही विष्णुमूर्ती साधारणपणे तेराशे वर्षांपूर्वीची आहे. या मूर्तीच्या अंगावर कोणतेही दागिने कोरलेले नाहीत. त्या काळी कंबोडिया, व्हिएतनाम येथील मूर्तींना कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने घातले जात असत, हे तेव्हाच्या शिलालेखांवरून समजते. व्हिएतनाममधील या मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध आणि सुरेख पद्धतीने घडवलेल्या आहेत. व्हिएतनाममधील मी सन या प्राचीन शैव तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शेषशायी विष्णूची मूर्तीदेखील सापडली होती, याबद्दल आपण व्हिएतनामवरील एका लेखात बघितले आहे.
इंडोनेशिया : इंडोनेशियातील प्राचीन हिंदू मूर्तींमध्ये काही विष्णुमूर्तीदेखील आहेत. इंडोनेशियातील जावा बेटावर सापडलेल्या विष्णुमूर्तींपैकी एका मूर्तीवर वर उल्लेख केलेल्या थायलंडमधील चैय्या येथील मूर्तीचा प्रभाव आहे. तर येथेच सापडलेल्या दुसऱ्या एका विष्णुमूर्तीत अधिक कोरीव काम केलेले आढळून येते. या चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा घेतलेली दिसून येते. या मूर्तीच्या मस्तकावर कोरीव किरीटमुकुट घातलेला आहे. या मूर्तीच्या कमरेच्या वस्त्रावरील चुण्यादेखील अत्यंत बारकाईने दाखवलेल्या आहेत. ही मूर्ती अंदाजे इसवीसनाच्या पाचव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली होती, असे अभ्यासकांचे मत आहे. या सुरुवातीच्या काळातील विष्णुमूर्तींखेरीज इतरही विष्णुमूर्ती इंडोनेशियामध्ये सापडतात. इंडोनेशियातील प्रंबानन येथील अकराशे वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या प्रसिद्ध मंदिरसमूहात एक विष्णुमंदिरदेखील आहे.
इंडोनेशियातील दीड हजार वर्षांपूर्वीच्या पूर्णवर्मन नावाच्या राजाच्या एका शिलालेखाशेजारी दोन पावले कोरलेली आहेत. ही पावले त्रिविक्रम विष्णूची असल्याचे तसेच पूर्णवर्मन राजा हा विष्णुसमान असल्याचे त्या शिलालेखातून नमूद केलेलं आहे. भूतलावरील पूर्णवर्मन राजा हा विष्णूचा अवतार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न राजाने या शिलालेखातून केलेला आहे.
आग्नेय आशियातील मोजक्याच विष्णुमूर्तींबद्दल माहिती करून देण्याचा प्रयत्न या लेखातून केलेला आहे. परंतु आग्नेय आशियातील या विविध देशांमध्ये विष्णूच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. अगदी शैवपंथाइतका नसला तरी वैष्णवपंथाचा प्रभाव आग्नेय आशियातील या देशांमध्ये होता हे तेथील विष्णुमंदिरे, शिलालेख आणि मूर्तींवरून लक्षात येते.
(सदराचे लेखक सांस्कृतिक वारसा अभ्यासक आहेत.)




























.jpg)










































.jpg)






































































































































.jpg)
.jpg)
.jpg)



























.jpg)





.jpg)





,_ruined_and_abandoned_after_a_Tipu_Sultan_attack_in_Wayanad_Kerala.jpg)
.jpg)







































































































.jpg)





.jpg)

.jpg)

































.jpg)









.jpg)

.jpg)







































.jpg)






































.jpg)









.jpg)
.jpg)





























































.jpg)


























































































































No comments:
Post a Comment