तेर आणि परिसर
त्या कालातील बौद्ध धर्माच्या नियमांप्रमाणे, बौद्ध भिख्खूंनी कोणत्याही प्रकारची म्हणजे स्थावर किंवा जंगम मालमत्ता प्राप्त करण्यास आणि बाळगण्यास संपूर्णपणे बंदी होती. त्याचप्रमाणे उदरनिर्वाहासाठी अत्यावश्यक असलेले अन्न आणि शरीरावर धारण करण्याची वस्त्रे ही सुद्धा समाजाकडून दान म्हणूनच मिळालेली असली पाहिजेत असेही कडक बंधन या बौद्ध भिख्खूंवर असे. हे नियम बघितल्यास, मनात साहजिकच असा प्रश्न उभा राहिल्याशिवाय रहात नाही की इ.स. पहिल्या शतकाच्या आसपास सह्याद्री पर्वताच्या कडेकपार्यांत व अत्यंत दुर्गम ठिकाणी स्थापना झालेल्या या बौद्ध मठात मोठ्या संख्येने वास्तव्यास असणारे हे बौद्ध भिख्खू, आपला उदरनिर्वाह कसा काय चालवत असतील? मागच्या शतकातील एक विद्वान व्यासंगी, कै. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी 1955 मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'जर्नल ऑफ द बॉम्बे ब्रॅन्च ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी' च्या अंकात या प्रश्नाचे एक सोपे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. प्रो. कोसंबी यांच्या मताप्रमाणे हे सर्व मठ त्या काली जे महत्त्वाचे व्यापार मार्ग होते त्यांच्या जवळच स्थापन केले गेले होते. त्याचप्रमाणे ज्या मठात मोठ्या संख्येने भिख्खू वास्तव्यास होते असे मठ जेथे असे दोन किंवा त्याहून जास्त व्यापारी मार्ग एकत्र येत होते अशा ठिकाणांजवळच फक्त स्थापन केले गेले होते. या रस्त्याने ये जा करणार्या व्यापारी मंडळींनी केलेल्या दानधर्मातून या बौद्ध मठांची गुजराण सहजपणे होत होती. प्रो. कोसंबी यांच्या मताने हे मठ या व्यापाऱ्यांना, सुरक्षा, व्यापारासाठी भांडवल पुरवठा, या सारख्या अनेक सेवा उपलब्ध करून देत असत व त्या बदल्यात त्यांना या व्यापार्यांकडून देणग्या सहजपणे मिळू शकत. अर्थात हा खुलासा ग्राह्य मानला तर असे प्रश्न उपस्थित होतात की एवढ्या मोठ्या संख्येने स्थापन झालेल्या या बौद्ध मठांना एवढा सशक्त आर्थिक आधार देऊ शकत असणारा हा व्यापार कोणामध्ये आणि काय प्रकारचा होता? या प्रश्नाचे उत्तर इतिहासाची थोडीफार जाण आणि आवड असणार्या बहुतेक वाचकांना ज्ञात असेलच. हा व्यापार अर्थातच सातवाहन साम्राज्य आणि रोमन साम्राज्य यांमध्ये चालत होता.
![]() Objects made of Conch-Shell |
![]() Objects made of Conch-Shell |
![]() Head of Teracota |

![]() Heads of Terracota |
![]() Heads of Terracota |
![]() Roman Grinder |


![]() TERRACOTTAS - Image with Child | ||
![]() TERRACOTTAS - Godess Seated on Lotus Pedestal | ||
![]() TERRACOTTAS - Pratima Dip | ||
Handle made of Conch | ||
Female Image of Ivory | ||
|


बौध्द धर्म आणि तेरचा संबध अगदी पहिल्यापासून आला असावा अशी शक्यता आहे. बौध्द धर्माची स्थापना झाल्यावर पहिला पंथ होता तो थेरवादी ज्यांना पुढे हीनयान म्हणले गेले. याच थेरवादी पंथावरुन पुढे तेर नाव पडले असावे. सातवाहन काळात तेरचे महत्व अतिशय वाढले असावे. तेरचा संबध आंध्र प्रदेशातील अमरावती, नागार्जुन तांडा आदी नगराशी प्रस्थापित झाल्याचे तेरमधील बौध्द अवशेषावरुन स्पष्ट झाल्याचे संशोधक सांगतात.

हलक्या आणि टिकाऊ विटांचं तंत्र त्याकाळी विकसित असावं. अशाच विटांचा एक बौद्धकालीन स्तूप 'तेर' एस टी स्टँडच्या समोरच केलेल्या उत्खननात नजीकच्या काळात सापडला आहे. मातीत मोठ्या प्रमाणात तूस मिसळून त्याची वीट उच्च तापमानाला भाजल्यास आतील तूस जळून जातं आणि सच्छिद्र पोकळ्या तयार झालेली वीट वजनानं खूप हलकी व मजबूत होते. या विटांची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यानं त्या पाण्यावर सहज तरंगतात.अशी पाण्यावर तरंगणारी वीट तिथल्या कै. रामलिंगप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालयात असून, अशाच विटेचा एक तुकडा गोरोबा काकांच्या मंदिरासमोर पाण्यावर तरंगताना दिसतो. महाराष्ट्रात मराठवाडा हे १५२४ पासून भूकंप प्रवण केंद्र असल्याच्या नोंदी आहेतच. प्राचीनकाळी जीवितहानी टाळण्यासाठी अशा हलक्या विटांची घरं आणि मंदिरं बांधण्याचं तंत्र तिथं विकसित झालं असावं.
पूर्वमध्ययुगीन तेर
| गणेश प्रतिमा, काळेश्वर मंदिर, तेर |
इंडो-रोमन व्यापाराला उतरती कळा लागल्यानंतर अनेक व्यापारिक केंद्रे ओसाड पडू लागली, परंतु ती पूर्णपणे लयास गेलेली नव्हती. सातवाहन काळातील मराठवाडयातील तेर हे एक असेच ठिकाण, जेथे सांस्कृतिक, व्यापारिक व राजकीय घडामोडी नंतरच्या काळातही अव्याहतपणे सुरु होत्या. साधारणतः सहाव्या शतकापासून ते बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत तेर परिसरात या घडामोडींविषयींचे अनेक पुरावे उपलब्ध पुरावशेषांतून दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने मंदिरे, शिल्पे, शिलालेख, वीरगळ इ. पुरावशेषांचा समावेश करता येवू शकतो. इ. सनाच्या चौथ्या शतकापासून पुढे सुमारे २०० वर्षे स्थानिक पातळीवर व्यापार सुरु असला पाहिजे. कारण याची परिणती म्हणून या भागात सुमारे सहाव्या शतकाच्या सुरुवातीला धाराशिव येथील जैन व चांभार लेणी खोदण्यात आलेली दिसतात. तेर येथील उत्खननात चौथ्या व पाचव्या कालखंडातील थर सु. वाकाटाक-चालुक्य ते पुढे मध्ययुगापर्यंतच्या काळाचा निदर्शक आहे. यावरून हे स्पष्ट होते की या कालखंडात येथे समृद्ध मानवी वस्ती अस्तित्त्वात होती.
| त्रिविक्रम मंदिर, तेर |
तेर येथील उत्तरेश्वराचे मंदिर द्राविडी शैलीतील असून पूर्णपणे विटांचे आहे. शां. भा. देव यांच्या मते हे मंदिर सातव्या शतकातील असावे. या मंदिराची चौकट लाकडी असून कित्येक वर्षांनंतर आजही टिकून आहे. चौकटीच्या ललाटबिंबावर देव-देवतांची सुंदर शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की याच्या बांधणीत साच्यात बनविलेल्या अलंकृत विटांचा वापर केलेला आहे.
| उत्तरेश्वर मंदिर, तेर |
| उत्तरेश्वर मंदिरावरील कोरीव काम, तेर |
संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिराशेजारील काळेश्वर मंदिर, चालुक्य काळातले मानले जाते. हे मंदिर विटांनी निर्मित असून काळ आणि शैली उत्तरेश्वर मंदिराशी मिळती-जुळती आहे.
| काळेश्वर मंदिर परिसर, तेर |
या शिवाय तेर येथे सिद्धेश्वर, नृसिंह मंदिर, त्रिपुरांतकेश्वर, अमरेश्वर, रामेश्वर, निलकंठेश्वर मंदिर इ. मंदिरे आहेत. सिद्धेश्वराचे मंदिर त्याच्या शैलीवरून यादवकालीन म्हणजेच १३व्या शतकातील वाटते. सध्या या मंदिराचा सभामंडप, गर्भगृह व स्तंभ अस्तित्त्वात आहेत. स्तंभशिर्षांवरील कोरलेले भारवाहक आकर्षक आहेत. नृसिंहाचे मंदिर गावाबाहेर असून त्याची बरीच पडझड झालेली आहे. तेरणा नदी पत्रात दगडांचा वापर करून बांधलेले त्रिपुरांतकेश्वर मंदिर होते. अमरेश्वराचे मूळ मंदिर सध्या अस्तित्त्वात नसले तरी सध्या अस्तित्त्वात असलेले प्राचीन शिवलिंग मूळ ठिकाणी दिसते. याशिवाय काळेश्वर मंदिर परिसरात अनेक लहान-मोठी तुलनेने जुनी शिवलिंगे आढळून येतात. ही सर्व शिवलिंगे कधीकाळी तेर परिसरात अस्तित्त्वात असलेल्या मंदिरांची आठवण करून देतात.
| सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप, तेर |
तेर येथील व्यक्तींना पूर्वमध्यकाळात किती महत्त्व प्राप्त होते, हे इ. स. ६१२ सालातील पश्चिमी चालुक्यांच्या एका अभिलेखावरून स्पष्ट होते. या शिलालेखात तेर येथील ‘जेष्ठशर्मन’ या प्रसिद्ध व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे. राष्ट्रकुटांच्या इ. स. ६९३ च्या एका ताम्रपटातही तगरनिवासी ‘हरगण द्विवेदी’ यांना जमिनी दान दिल्याचा उल्लेख आहे. तेर येथील अकराव्या ते सोळाव्या शतकापर्यंतचे चार लेख ग. ह. खरे यांनी संपादित केले आहेत. यातील अकराव्या शतकातील कानडी भाषेतील शिलालेख त्रिविक्रम मंदिरात आहे. यात कलचुरी घराण्यातील महामंडलेश्वर ‘जोगमरस’ तसेच ‘वारीमल्लोज’ या शिल्पीचा उल्लेख आलेला आहे. बाराव्या शतकातील मराठी शिलालेख मारुतीच्या देवळाच्या पाराजवळचा असून यात उद्यापनाच्या निमित्ताने दिलेल्या दानाचा उल्लेख आहे. जिन बसदी येथे पार्श्वनाथाच्या सिंहासनावर चौदाव्या शतकातील शिलालेखात वार्धमानाच्या देवालयाचा जीर्णोद्धार केल्याचा तसेच पादुकादानाचा उल्लेख आहे.
याशिवाय, तेर येथून पूर्वमध्ययुगीन कालखंडातील भरपूर मूर्ती-शिल्पे मिळालेली आहेत. यामध्ये विष्णू-नारायण, कार्तिकेय, भैरव व इतर देवी-देवतांची शिल्पे महत्त्वपूर्ण आहेत. तेर येथून प्राप्त झालेली बहुतेक शिल्पे येथील श्री. रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. या संग्रहालयात तसेच काळेश्वर मंदिरात काही वीरगळ दिसून येतात. काळेश्वर मंदिरातील वीरगळांचा कालखंड प्राचीन असून त्यांच्या शैलीवरून ती यादवकाळाच्याही पूर्वीची वाटतात.
| रगळ, तेर |
धाराशिव आणि तेरचा निकटचा संबंध असावा असे कर्कंडचरिउ व बृहत्कथाकोश या दोन ग्रंथांमधील उल्लेखांवरून समजते. बृहत्कथाकोशात धाराशिव येथील जिन मंदिरातील मूर्तीचा उल्लेख आलेला आहे. ‘तेरापूर’ या गावाच्या दक्षिणेस धाराशिवच्या जंगलात या मूर्ती सापडल्याची माहिती यात दिली आहे. या ग्रंथाचा नायक ‘कर्कंड’ हा तेरापुर येथील एका व्यापाऱ्याचा मुलगा होता, असे सांगितले आहे. यावरून तेर येथील व्यापार अगदी दहाव्या शतकापर्यंत अस्तित्त्वात असावा असे दिसते. अकराव्या शतकातील कर्कंडचरिउ या ग्रंथातही अशा आशयाची माहिती दिलेली आहे.
तेराव्या शतकातील संतकवी गोरा कुंभार यांचे समाधिस्थळ तेरणा नदीकाठी असलेल्या काळेश्वर मंदिराजवळ आहे. संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायात जेष्ठ संत समजले जात. यामुळे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेही तेरचे महत्त्व अधोरेखित होते.
बाराव्या-तेराव्या शतकात तेर येथे एक जैन देवालय (बसदी) बांधण्यात आले, ते वर्धमान महाविराचे असून त्याचा जीर्णोद्धार शके १३१३ मध्ये केला, असे येथील एका शिलालेखावरून दिसून येते. तसेच कर्कंडचरिउ व बृहत्कथाकोश या ग्रंथांतील आशयावरून १०व्या शतकापुर्वीच जैन मत तेरमध्ये प्रभावी होते, असे दिसून येते.
| जैन मंदिरातील जैन प्रतिमा, तेर |
| संत गोरा कुंभार मंदिराच्या भिंतीत लावलेली विष्णू प्रतिमा, तेर |
तिर्थ बुद्रुक : सातवाहनकालीन बौद्ध केंद्र :-
या काळात महाराष्ट्राचे नाव दक्षिणापथ होते. सातवाहनकाळातील प्रचलित व्यापारी मार्ग म्हणजे सध्याच्या गुजरातमधील भडोचमधून सध्याच्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पैठण आणि पुढे तेरकडे जाणारा व्यापारी मार्ग.
तेरमध्ये सातवाहन आणि रोम साम्राज्याशी संबधीत अवशेष सापडले आहेत. यामध्ये नाणी, भांडी, हस्तिदंती बाहुल्या, विवीध प्रकारचे रोमन दिवे या वस्तु सापडल्या. तेरमध्ये सापडलेली हस्तिदंती बाहुलीचे हि ईटलीमधील पॉम्पे इथे सापडलेल्या हस्तिदंती मुर्तीशी खुप साम्य आहे. आतापर्यंत कर्नाटकामधील कलबुर्गी जिल्ह्यातील संती कंगनहल्ली हि प्राचीन व्यपारी पेठ आहे अशी तज्ज्ञांची मान्यता होती, पण याच्यामध्ञे तेर देखील येते हे सिध्द झाले. या प्रदेशातीळ पुरातन अवशेष आणि सातवाहन संबधीत ग्रंथामधून या गोष्टी सामोर्या आल्या. याच अनुषंगाने तीर्थ ( बुद्रुक ) गावामध्ये बौद्ध धर्माशी संबंधित शिल्प आणि स्तूप असे अवशेष सापडले.

संदर्भ ग्रंथ
२ ) दीक्षित, मो. ग., ‘तेर वस्तुसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचा परिचय’, भारतीय इतिहास आणि संस्कृती, वर्ष ९, १९७२. मुंबई मराठी संग्रहालय, मुंबई.
३ )देव, शां. भा. ‘तेर’, पुरातत्त्व-शोध-निबंधमाला, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, १९८७. मुंबई.
४ ) Mate, M.S. 1957, ‘Trivikram Temple at Ter’ Bulletin of the Deccan College Post-Graduate and Research Institute, Poona,Vol. XVIII, pp.1-4.
तिर्थ बुद्रुक : सातवाहनकालीन बौद्ध केंद्र
![]() |
| संभवतः गौतम बुद्ध के जीवन से संबंधित घटना (सफ़ेद चूना पत्थर में बना शिल्प) |
आज से लगभग १८०० साल पूर्व वर्तमान महाराष्ट्र सहित दक्षिण भारत के अधिकांश हिस्से पर सातवाहनों का अधिकार था. इनका व्यापार यूरोप के रोमन साम्राज्य के साथ भी हुआ करता था. रोमन साम्राज्य से विभिन्न प्रकार का सामान भारतीय प्रायद्विप के पश्चिमी समुद्री तट पर बने बंदरगाहों तक जहाजों के माध्यम से आया करता था. इन बंदरगाहों से भारत के अंदरूनी प्रदेशों से व्यापारी-सामान रोमन साम्राज्य के लिए निर्यात किया जाता था. हमारे व्यापारी भी इस वैश्विक व्यापार में निपुण थे. मसाले, मणि, सूती कपड़ा तथा अन्य जीवनावश्यक वस्तुओं का लेन-देन व्यापार के माध्यम से हुआ करता था. यह व्यापार सातवाहनकाल में अपनी चरम सीमा तक पहुँच चुका था. इसी कारण से भड़ोच, शुर्पारक (नाला सोपारा), कल्याण, चौल, ब्रह्मपुरी, भोकरधन, अरिकामेडू आदि व्यापारिक केन्द्रों एवं शहरों का विकास दिन-दूनी रात चौगुनी गति से हो रहा था.
| तिर्थ बुद्रुक के निवासी |
जीवन के हर अंग जैसे समाज, संस्कृति, धर्म, व्यापार, शिल्पकला एवं स्थापत्य में भी तेजी से विकास हो रहा था. इस समय बौद्ध धर्म का प्रचलन इस प्रदेश में अधिक था. बौद्धों से संबंधित स्तूप, विहार, मठ आदि वास्तुओं का निर्माण द्रुतगति से हो रहा था. भारतीय महाद्वीप में अनेक व्यापारिक मार्गों का निर्माण हो चुका था. या पहले से प्रचलन में रह चुके मार्गों का महत्त्व अब बढ़ चुका था. इनमें से एक मार्ग महाराष्ट्र के मराठवाड़ा (मध्य महाराष्ट्र) क्षेत्र से होकर गुजरता था, जिसे उस समय ‘दक्षिणापथ’ के नाम से भी जाना जाता था. मराठवाड़ा के पैठण और तगर (तेर) नामक समृद्ध केन्द्रों का नाम रोमन साम्राज्य तक पहुँच चुका था.
| तेर से प्राप्त मृणमूर्तियाँ (टेराकोटा), तेर (तेर संग्रहालय से साभार) |
तेर में सातवाहनों एवं रोमन सम्राज्य से संबंधित अवशेष पाए गए हैं. इनमें सिक्के, मर्तबान, हस्तिदंत से बनी स्त्रीमूर्ति, विभिन्न प्रकार के रोमन दीप आदि वस्तुएँ सम्मिलित थीं. तेर से प्राप्त हस्तिदंत से बनी मूर्ति इटली के पॉंपेई से प्राप्त मूर्ति से मिलती-जुलती है. अब तक तेर के बाद अगले पड़ाव के रूप में कर्नाटक के कलबुर्गी जिले में स्थित ‘सन्नती-कनगनहल्ली’ की चर्चा ही विद्वानों में थीं. लेकिन इन दोनों के बीच भी कुछ केन्द्रों का होना तय था. इसी दिशा में मैंने इस प्रदेश के प्राचीन पुरावशेषों से संबंधित ग्रंथों को पढ़ना एवं इस संबंधित स्थानों को भेंट देने का सिलसिला शुरू कर दिया. इसी प्रक्रिया का परिणाम था- तीर्थ बुद्रुक में नए सिरे से प्राप्त हुए बौद्ध धर्म से संबंधित शिल्प एवं स्तूप के संभावित अवशेषों की महत्त्वपूर्ण खोज.
![]() |
| भिमाशंकर टीला (सातवाहनकालीन स्तूप? के अवशेष), तिर्थ बुद्रुक |
तीर्थ बुद्रुक नामक छोटासा गाँव महाराष्ट्र के उस्मानाबाद (प्राचीन धाराशिव) जिले के तुलजापुर तहसील से मात्र ९ किमी की दुरी पर बालाघाट पहाड़ियों की एक पहाड़ी पर स्थित है.
![]() |
| तिर्थ बुद्रुक गाँव का परिदृश्य |
सन २००१ में किसी साधू की कुटिया के लिए यहाँ पर स्थित एक टीले की खुदाई का काम चल रहा था. ग्रामीणों को खुदाई से बड़ी आकर की कुछ ईंटें बरामद हुई. यह काम तत्काल रोका गया. यह खबर हवा की तरह प्रदेश में फ़ैल गई. महाराष्ट्र के पुरातत्त्व विभाग के संचालक ने खबर सुनते ही उक्त स्थान की छान-बीन की. ये ईंटों से निर्मित एक गोलाकृति स्तूप के अवशेष थे (संभवतः यह एक अन्य मनौती स्तूप रहा होगा). उन्होंने बाद में इस संबंधी एक संक्षिप्त टिपण्णी विभाग की पत्रिका में भी छपवाई. ऐसा करते समय उन्होंने वहाँ पर पड़े अन्य महत्त्वपूर्ण पुरावशेषों एवं इस स्थान के प्राचीन महत्त्व की ओर अधिक ध्यान नहीं दिया. इसके बाद इस स्थान के बारे में कहीं कुछ ख़ास लिखने या सुनने में नहीं मिला.
![]() |
| कालभैरवनाथ मंदिर एवं आस-पास का सामान्य दृश्य, तिर्थ बुद्रुक |
सन २००८-०९ में मेरे अपने गाँव अपसिंगा में सातवाहनकालीन अवशेष प्राप्त हुए, जो तिर्थ बुद्रुक से महज १६ किमी की दुरी पर स्थित है. यहाँ एक प्राचीन ढाँचे की रचना मिली, जो संभवतः किसी स्तूप की भी हो सकती है. तत्पश्चात २०१३ में इन अवशेषों पर एक शोधलेख भी प्रकाशित किया गया.
![]() |
| अपसिंगा (सातवाहनकालीन पुरास्थल) से प्राप्त ईंटों की संरचना |
२०१३ में मैंने तिर्थ बुद्रुक के लगभग १४वीं सदी में निर्मित कालभैरवनाथ मंदिर को भेंट दी. इस मंदिर के प्रांगण में रखे कुछ शिल्प दिखाई पड़े.
डेक्कन कॉलेज, पुणे में मंदिर एवं स्थापत्य की पढ़ाई का अनुभव यहाँ काम आया. इसी दौरान मैं डेक्कन कॉलेज से पी.एचडी भी कर रहा था. सर्वेक्षण का कार्य सर्वत्र शुरू था. मंदिर के सामने रखे सफ़ेद चूना पत्थर (लाइमस्टोन) में बने शिल्प मुझे कुछ अलग लगे. मैंने आस-पास के क्षेत्र की अधिक छान-बीन की. इसमें मुझे स्तूप के लिए सफ़ेद चूना पत्थर में बने अलंकृत रचनाओं के अवशेष दिखाई पड़े.
![]() |
| स्तूप के अवशेष, तिर्थ बुद्रुक |
यहाँ पर लगभग १३वीं सदी में बने भिमाशंकर टीले पर भी सातवाहनकालीन ईंटे तथा ईंटों से बनी किसी स्थापत्य-रचना के अवशेष दिखाई दिए. यह मंदिर तथा प्राचीन टीला खंडहर में बदल चुके थे.
![]() |
| प्राचीन टीले पर बने भिमाशंकर मंदिर के अवशेष, तिर्थ बुद्रुक |
![]() |
| भिमाशंकर मंदिर के अवशेष, तिर्थ बुद्रुक |
इसके बाद कईं बार मैंने इस क्षेत्र का दौरा एवं सर्वेक्षण किया. इसकी विस्तृत जानकारी प्राप्त करने के बाद मुझे ज्ञात हुआ कि यहाँ पर पड़े शिल्प एवं अन्य अवशेष अमरावती और सन्नती-कनगनहल्ली के स्तूपों से मिलते-जुलते हैं. यहाँ से चूना पत्थर में बने शिल्पों के साथ सातवाहनकालीन मृद्भांड के ठिकरें, घर की छत पर लगाए जाने वाले खपरैल (tiles) तथा पद्म पदक (medallions) भी प्राप्त हुए हैं.
![]() |
| स्तूप से संबंधित पद्म पदक (Medallion), तिर्थ बुद्रुक |
मध्ययुगीन अवशेषों में भिमाशंकर एवं कालभैरवनाथ मंदिर के अवशेष, शिवलिंग, भैरव, महिषासुर मर्दिनी, विष्णु के शिल्प, वीरगल (hero stones), सती शिला, नंदी की प्रतिमाएँ, मंदिर से संबंधित शिलालेख आदि अवशेष प्रमुख हैं.
![]() |
| कालभैरवनाथ का मंदिर, तिर्थ बुद्रुक |
![]() |
| भैरव, कालभैरवनाथ मंदिर, तिर्थ बुद्रुक |
![]() |
| महिषासुरमर्दिनी, तिर्थ बुद्रुक |
मैंने २०१५ में हैदराबाद में संपन्न पुरातत्त्व से संबंधित अंतर्राष्ट्रीय सेमिनार में तिर्थ बुद्रुक के इन पुरावशेषों सहित यहाँ के मध्ययुगीन अवशेषों पर शोधकार्य प्रस्तुत किया था.
![]() |
| वीरगल एवं नाग शिल्प, तिर्थ बुद्रुक |
![]() |
| वीरगल (hero stone), तिर्थ बुद्रुक |
![]() |
| नंदी, तिर्थ बुद्रुक |
तिर्थ बुद्रुक से प्राप्त आद्य ऐतिहासिक अवशेषों का संबंध सातवाहनकाल से था. इस समय इंडो-रोमन व्यापार अपनी चरम सीमा पर था तथा व्यापारियों का आवागमन इस क्षेत्र में हुआ करता था. लगभग इसविसन की १ से ३री सदी में यहाँ चूना पत्थर एवं ईंटों से निर्मित स्तूप का निर्माण कार्य हुआ होगा. संभवतः समृद्ध व्यापर के चलते यह कार्य सफल हुआ था. अबतक दक्षिणापथ के इस व्यापारी मार्ग पर महाराष्ट्र में तेर के बाद भव्य वास्तु के अवशेष प्राप्त नहीं हुए थे. तीर्थ बुद्रुक के स्तुपावशेषों से यह बात सामने आ रही है कि तेर के बाद व्यापारी मार्ग पर तिर्थ बुद्रुक एक महत्त्वपूर्ण पड़ाव था, जो आगे जाकर सन्नती नामक स्थान से जुड़ जाता था, जबकि यह तेर इतनी विस्तृत बस्ती नहीं थी. हालाँकि इसी जिले के सिद्धेश्वर वडगाँव के सिद्धेश्वर मंदिर के पास सातवाहनकालीन एक स्थापत्य रचना प्राप्त हुई है. यहाँ पर इस काल से संबंधित ईंटें बड़ी संख्या में मिलती हैं.
| संभवतः स्तूप का टीला, वडगाँव सिद्धेश्वर |
तिर्थ बुद्रुक से प्राप्त शिल्प संभवतः गौतम बुद्ध के जीवन से संबंधित है. इसमें एक पुरुष एवं तीन स्त्रियों को दर्शाया गया है.
![]() |
| स्तूप से जुड़ा चूना पत्थर में बना शिल्प |
![]() |
| हंसपट्टिका, तिर्थ बुद्रुक |
इन शिल्पों के लिए प्रयोग किया गया सफ़ेद चूना पत्थर (limestone) दक्षिण महाराष्ट्र में नहीं मिलता. इसलिए अब यह निश्चित रूप से कहा जा सकता है कि यह पत्थर सन्नती-शहाबाद के क्षेत्र से यहाँ व्यापारी मार्ग से लाया गया था. कनगनहल्ली के स्तूप को सजाने के लिए वहाँ से बड़ी तादाद में मिलने वाले सफ़ेद चूना पत्थर का ही इस्तेमाल किया गया था. सातवाहनकालीन अन्य शिल्पों एवं स्थापत्य रचना को देखकर यह अनुमान लगाया जा सकता है कि यह स्तूप हीनयान मत से संबंधित रहा होगा. यहाँ के शिल्प अमरावती शैली में बनवाए गए हैं. यह स्थान अमरावती शैली में बने शिल्पों का एक महत्त्वपूर्ण उत्तरी केंद्र माना जा सकता है. अपितु, इस प्रकार के कुछ अवशेष तेर नामक स्थान पर भी मौजूद होने के कारण, अब तेर यह स्थान अमरावती शैली में बने शिल्पों के फैलाव की उत्तरी सीमा बताई जा सकती है. तिर्थ बुद्रुक और तेर के शिल्पों की शैली अमरावती होकर उक्त शिल्पों की रचना कनगनहल्ली और अमरावती से थोड़ी सी भिन्न दिखाई देती है. संभवतः इस पर स्थानीय कारीगरी का प्रभाव पड़ा हो.
![]() |
| संभवतः मोर की आकृति, तिर्थ बुद्रुक |
![]() |
| खंडित स्तूप (लाट) के अवशेष |
![]() |
| प्राचीन टीले का एक हिस्सा, तिर्थ बुद्रुक |
![]() |
| सातवाहनकालीन ईंटों से निर्मित दीवार, तिर्थ बुद्रुक |
![]() |
| स्तूप संबंधित अवशेष, तिर्थ बुद्रुक |
![]() |
| टीले का एक खुला भाग, तिर्थ बुद्रुक |
सातवाहनकालीन स्थापत्य रचना के अवशेष उस्मानाबाद जिले में गड देवदरी, तेर, वडगाँव-सिद्धेश्वर एवं अपसिंगा में भी दिखाई देते हैं. इनमें से वडगाँव और अपसिंगा की स्थापत्य रचना बौद्ध-स्तूप से संबंधित होने के प्रमाण अब तक मौजूद नहीं हैं.
| गड देवदरी का प्राचीन टीला, गडदेवदरी |
इन समृद्ध अवशेषों के मिल जाने से ऐतिहासिक दृष्टि से मराठवाड़ा के इस क्षेत्र का महत्त्व बढ़ चुका है तथा तिर्थ बुद्रुक यह स्थान सातवाहनकालीन एक बौद्ध केंद्र के रूप में वैश्विक पटल पर स्थापित होने में मदद मिली है.
सातवाहन व्यापारातील महत्वाचे केंद्र : तगरपूर अर्थात तेर
Periplus of Erythrean Sea या पहिल्या शतकातील पुस्तकात रोमन आणि इजिप्शियन व्यापाऱ्यांना भारतातील व्यवसायिक संधींबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. या पुस्तकात आजच्या भारत आणि पाकिस्तानमधिल ब~याच शहरांबद्दल माहिती सापडते. सोबतच सातवाहन काळातील व्यापारी जाळ्यांबद्दल देखिल विस्तृत स्वरूपात माहिती मिळते. यामध्ये आजच्या कल्याण, उज्जैन, पैठण, नालासोपारा, तिरूचिरापल्ली, पुदुच्चेरी अशा शहरांचा उल्लेख सापडतो. यामध्येच तगरनगर अथवा तगरपूर या एका महत्वाच्या व्यापारी केंद्राचा उल्लेख देखिल दिसून येतो. हे तगरपूर म्हणजे आजच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तेर हे गाव आहे.

Periplus of Erythrean Sea नुसार व्यापारी नकाशा
तेर हे सातवाहन काळात जसे व्यवसायिक दृष्टीने महत्वाचे केंद्र होते, तसेच ते सांस्कृतिक दृष्टीने देखिल अतिशय महत्वपूर्ण केंद्र राहिलेले आहे. या गावात हिंदू, बौद्ध आणि जैन या तीन धर्मांची विविध प्रार्थनास्थळे एकत्र नांदत होती हे उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमध्ये दिसून येते.
तेर मध्ये झालेली पुरातत्व उत्खनने
तेर मध्ये सर्वप्रथम १९५७-५८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या (तत्कालिन बॉम्बे रेसिडेन्सी) Archives and museum विभागातर्फे उत्खनन पार पडले. या उत्खननामध्ये सर्वप्रथम तेर शहर इस पूर्व ४ थे शतक ते इस ४ थे शतक या काळात अतिशय गजबजलेले होते ही बाब समोर आली. याच उत्खननात मातीपासून बनलेले (terracotta) बरेच खेळणी, लहान मुर्त्या, भांडी, दागिने आणि इतर वस्तू दिसून आल्या. १९६६ ते ६९ दरम्यान याच विभागातर्फे पुन्हा एकदा विस्तृत असे उत्खनन येथे पार पडले. तत्पुर्वी गावातील जुने जमिनदार श्री रामलिंगप्पा लामतुरे यांनी गावात विविध ठिकाणी सापडलेल्या आणि त्यांच्याजवळ असलेल्या वस्तूंबद्दल शासनास माहिती दिली होती. आणि याच माहितीच्या आधारावर अधिक विस्तृत उत्खनन सुरू करण्यात आले होते. या उत्खननात तेर शहरातील ऐतिहासिक वसाहतींबद्दल माहिती मिळाली. या उत्खननात सापडलेल्या माहितीनुसार परिसरातील सर्वात जुनी वसाहत मौर्य काळात (इस पूर्व ३ रे शतक ते इस पूर्व १ ले शतक) या काळातील होती. ही वसाहत एका मोठ्या पुरामध्ये नष्ट झाली होती. दुसरी वसाहत इस पूर्व १ ले शतक ते इस १ ले शतक या काळातील आहे. या वसाहतीच्या अखेरील शहरात एक मोठी लागली होती, ज्यामध्ये बरीच घरे जळून खाक झाली होती. तिसरा सर्वात महत्वपूर्ण टप्पा इस ५० ते इस २०० च्या काळातील आहे. याच काळात हे शहर खूप मोठे व्यवसायिक केंद्र म्हणुन उदयास आले होते.
आजच्या तेरणा नदीच्या काठावर बरीच रोमन कालिन वस्तू आणि घरांचे अवशेष सापडले आहे. यामध्ये रोमन कालिन अथवा रोमन शैलीतील मातीची खेळणी, मुर्त्या, दिवे, भांडे, रोमन नाणी, जवाहिर अशा वस्तूंचा समावेश आहे. या उत्खननात सापडलेल्या घरांच्या पायांमध्ये एक विशेष बाब होती. या सर्वच घरांचे पाये हे, पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी उंच भिंती बांधलेल्या होत्या, याचा पुरावा देणारे आहेत. यामुळे परिसरात वारंवार तेरणा नदिला पूर येत असे हे लक्षात येते.
याच टप्प्यात चक्राकार आकार असलेल्या एका स्तुपाचे अवशेष सापडले. सातवाहन वंशाच्या पुलुमावी राजाच्या काळातील एक नाणेदेखिल याच ठिकाणी सापडले. यावरून हे स्तुप दुस~या शतकाच्या उत्तरार्थातील असल्याचे लक्षात येते. सोबतच त्रीविक्रम मंदिराजवळच हस्तिपृष्ठ शैलीतील (apsidal) विटांचे बांधकाम असलेले एक अवशेष देखील सापडले. या अवशेषामध्ये एक मोठे मंडपदेखील होते, जे कदाचित लाकडी खांबावर उभे होते.

तेर येथे उत्खननात सापडलेले स्तुपाचे अवशेष
या टप्प्यात ब~याच गैर भारतीय वस्तू देखिल सापडल्या. ज्यामध्ये कार्नेलियन शिक्के, मातीचे खेळणे, आणि विशेष प्रकारचे दिवे यांचा समावेश आहे. Periplus of Erythrean Sea या पुस्तकात उल्लेख आहे की दक्षिण भारतातून निर्यातयोग्य सामान तगर येथे येत असे. आणि तेथून पैठण मार्गे पश्चिम किना~यावरील बंदरावर पाठविले जात असे. सोबतच येथे उत्तम प्रतिच्या कापडाची निर्मिती होत असे. उत्खननात सापडलेले कापडाला रंग करण्यासाठी बनलेले खड्डे या गोष्टीची साक्ष देतात.
उत्खननाचा तिसरा टप्पा १९७४-७५ या काळात पार पडला. सातवाहन काळातील सांस्कृतिक आणि व्यवसायिक स्वरूप समजून घेण्यासाठी हे उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात पुन्हा एकदा येथील वसाहतीच्या तीन टप्प्यांवर शिक्कामोर्तब झाले. सातवाहन काळातील व्यवसायिक भरभराटीचे देखिल पुरावे या उत्खननात सापडले. या उत्खननात तेरच्या दक्षिण पूर्व दिशेला १६ किमी अंतरावर इर्ले या गावात एक स्तुपवजा टेकडी सापडली होती. या टेकडीवर पुढील काळात उत्खनन होऊ शकले नाही.
उत्खननाचा चौथा टप्पा १९८७-८९ या काळात पार पडला. या उत्खननात एक विटांनी बनलेले बारव सापडले. या बारवजवळच एक हस्तिपृष्ठ शैलीतील इमारतीचे अवशेष देखिल सापडले होते. सोबतच चुनखडीच्या खांबांचे अवशेष, भांडी, बांधकामाचे अवशेष आणि इतर ब~याचश्या वस्तू या उत्खननात सापडल्या. पुढे २०२० मध्ये एका इमारतीच्या बांधकामादरम्यान सातवाहन काळातील एक विहीर सापडली.
तेरच्या आजूबाजूला आजही ब~याचश्या टेकड्या आणि जागा उत्खनन आणि संशोधनासाठी अंकित करण्यात आलेल्या आहेत. येत्या काळात या जागांवर उत्खनन होऊन आणखी बरीच तथ्ये आणि अवशेष सापडतील अशी अपेक्षा आहे.
आजचे तेर
आजच्या धाराशिव जिल्ह्यात तेर हे एक छोटेसे खेडेगाव आहे, जे संत गोरोबा काका यांच्या मंदिरासाठी जास्त प्रसिद्ध आहे. वारकरी संप्रदायातील मध्ययुगिन संत असलेल्या गोरोबा काका यांचे मंदिर तेरणा नदिच्या काठावर वसलेले आहे. याच मंदिराच्या परिसरात एक प्राचिन हस्तिपृष्ठ शैलीचे मंदिर आहे. या काळेश्वर मंदिराचे शिखर हे हस्तिपृष्ठ आणि स्तंभ बांधकामाचे मिश्रण आहे. पुरातत्वात आवड असणा~या व्यक्तींमध्ये विशेष प्रसिद्ध असलेले त्रिविक्रम मंदिर हे हस्तिपृष्ठ शैलीतील मंदिर गावाच्या मध्यभागी वसलेले आहे. आज पुर्णत: हस्तिपृष्ठ शैलीतील शिल्लक असलेल्या केवळ दोन मंदिरांपैकी हे एक आहे (दुसरे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर जिल्ह्यात छेजरला येथे आहे). मंदिर बांधणी शैलीच्या उत्क्रांतीमधिल एक महत्वाचा दुवा म्हणून या मंदिराकडे पाहता येईल

त्रीविक्रम मंदिर , तेर
सुरूवातीला हे मंदिर एक पूर्णत: हस्तिपृष्ठ शैलीचे स्मारक होते. या मंदिराची शैली लेण्यांमधिल चैत्यासोबत खूप साधर्म्य असणारी आहे. पुढील काळात (कदाचित ६ व्या शतकात) या स्मारकात सपाट छत असलेल्या एका मंडपाची भर टाकली गेली. या मंदिराची हस्तिपृष्ठ शैली ही तक्षशिला (इस पूर्व ३० ते इस ५०) येथे सापडलेल्या स्मारकांच्या संरचनेशी खूप साधर्म्य असणारी आहे. त्यामुळे त्रीविक्रम मंदिर हेदेखिल त्याच काळातील असावे असा संशोधकांचा अंदाज आहे. सातवाहन काळातील या मंदिरात आज विष्णूच्या वामन अवताराची त्रीविक्रम प्रतिमा विराजमान आहे. त्रीविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचिन बांधकाम म्हणून ओळखले जाते. हस्तिपृष्ठ शैली आजच्या काळात दुर्मिळ असली तरी या गावात या शैलीचे बरेच अवशेष सापडले आहेत. त्यामुळे स्तुपांपासून चौरस अथवा आयताकृती मंदिरांकडे झालेल्या स्थित्यांतरातील एक महत्वाचा दुवा म्हणून आपण तेर गावाकडे पाहू शकतो.
याच स्थित्यांतरातील आणखी एक महत्वाचा दुवा आहे तेर मधिल उत्तरेश्वर मंदिर. विटांचे बांधकाम असलेल्या या मंदिरामध्ये विटांसोबतच लाकडाचा देखिल बांधकामासाठी झालेला वापर दिसून येतो. या मंदिराच्या गर्भगृहातील द्वारशाखा तत्कालिन लाकडी कलाकुसरीचा एक उत्तम नमुना आहे. आज ही द्वारशाखा गावातील पुरातत्विय वास्तुसंग्रहात ठेवलेली आहे.

उत्तरेश्वर मंदिर, तेर
गावात झालेल्या उत्खननांमध्ये स्तुपांचे बरेच अवशेष सापडलेले आहेत. काही भांड्यांवर त्रीरत्न (बुद्ध, धर्म आणि संघ यांना दर्शविनारे एक बुद्ध धर्मातील चिन्ह) हे चिन्ह अंकित केलेले सापडले आहे. यावरून या भागात बौद्ध धर्माचा देखिल असणारा प्रभाव लक्षात येतो. जवळच असलेल्या धाराशिव आणि खरोसा येथील लेण्यांमध्ये बौद्ध धर्माचे असलेले शिल्प देखील या गोष्टीची ग्वाही देतात.
तेर येथे एक पुरातन दिगंबर जैन मंदिरदेखिल आहे, जे या प्रदेशातील जैन धर्माच्या प्रभावाची जाणिव करून देते. या मंदिरास जैन धर्मामध्ये “अतिशय क्षेत्र” (खूप जास्त पवित्र असणारे ठिकाण) असे संबोधले जाते. जवळपासच्या भागात खूप ठिकाणी सापडलेले जैन अवशेष आणि धाराशिव लेण्यांमध्ये असलेले जैन शिल्प हे या भागात असलेल्या जैन धर्माच्या प्रसाराची जाणिव करून देतात. आज येथे असलेले मंदिर हे साधारणत: १२ व्या शतकातील आहे. येथील पार्श्वनाथ मंदिराच्या पुनर्निमाणाच्या वेळी जैन धर्माशी संबंधित बरीचशी शिल्पे सापडली आहेत. त्यामुळे १२ व्या शतकाच्या आधीसुद्धा तेरमध्ये जैन धर्माचा प्रभाव होता हे लक्षात येते. ही सर्व शिल्पे आज मंदिरात ठेवण्यात आलेली आहेत.

जैन मंदिराच्या बांधकामाच्या वेळी सापडलेले अवशेष
तेर गावात एक पुरातत्विय संग्रहालय देखिल आहे. गावातील जुने जमिनदार कै रामलिंगप्पा लामतुरे ( ज्यांनी त्यांच्याकडे असलेला पुरातत्विय ठेवा सरकारला भेट केला) यांच्या नावाने हे संग्रहालय उभे केले गेलेले आहे. पुरातत्विय आणि इतिहासप्रेमींसाठी हे संग्रहालय एक अमूल्य असा ज्ञानाचा ठेवा आहे.
तेरबद्दल एक मजेशिर बाब
खिचडी हे आजच्या काळात एक अतिशय महत्वपूर्ण असा खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ आपल्याकडे २००० वर्षांपूर्वी देखिल अस्तित्वात होता याचे पुरावे तेर येथील उत्खननात सापडले आहेत. तेर मध्ये उत्खननात एका भांड्यामध्ये भात आणि मुंग दाळ यांना एकत्र करून बनविलेल्या पदार्थाचे अवशेष सापडले आहेत. यावरून या भागात २ सहस्त्रकांआधी खिचडी हा पदार्थ बनविला जात होता हे लक्षात येते.











































































