Tuesday, May 23, 2023

Kadamba Devi Temple

 Mahuli,Maharashtra

Overview


Mahuli is a village in Khanapur taluka 16.09 km (ten miles) north of Vite on the Vite-Mayani road. It has a remarkable temple dedicated to Kadamba Devi. The temple is in the centre of the village, though not easy to find out. It is partially in a dilapidated condition.


About The Temple


The Kadamba Devi Temple, believed to be from the late Shilahar period or the early Hemad-Panti (Yadav) period, is in a severe state of disrepair and has been taken up for restoration by the state archaeology department. It is about 12.19 metres (40 ft.) long by about 6.09 metres (20 ft.) broad and consists of a hall or Mandap with a shrine and vestibule, but without a spire. It is built of gray trap on a platform about 3.04 metres (ten feet) above the average level of the village streets. It is closely surrounded by mud houses and therefore seen to less advantage than many of the old temples which are usually found in vacant spaces and often outside the villages. It is raised on a stone plinth about 0.914 metres (three feet) high, the face of which is cut in a lozenge pattern. The walls are different from the usual type of Hemad-panti temples in the district being elaborately carved externally, specially the shrine wall.

The hall or mandap is 1.85 m2 (20 ft. square) and the walls reach to the roof not as usual left solely for support to the pillars. The line of the front or east wall is straight and contains a square entrance but is in bad repair, the carved work nearly defaced and everywhere blocked up with mud and stones put in to prop it up. The side walls, which also contain two square entrances, are as usual rather wider at the centre, the outline slightly resembling the cruciform. The stones are pointed in beaded and tooth work and floral decorations are faintly carved on them. The vestibule to the shrine is about 1.52x5.79 metres (five feet by nineteen). The shrine is star-shaped and about 4.57x6.09 metres (15'x20') at the widest part.

At the west, north and south sides are flat faces connected by zigzags showing five corners. These walls are carved in much the same way as the hall or mandap walls but far more elaborately. The faces contain niches with images of deities fairly well executed. The image in the north niche is Mahisasur Devi riding on a buffalo and holding the child Parasurama in her lap, the image on the west is of Narsimha, the man-lion; and the image on the south is Ganapati and sadanana or Kartikeya. The roof has heavy caves of carved stone but scarcely projecting and modern brick parapet.


How To Reach Mahuli


The nearest airport is Sambre Airport, Belgaum, Karnataka. There is no railway station near to Mahuli in less than 10 km. Sangli Railway Station (near to Sangli), Madhavnagar Railway Station are the Railway stations reachable from nearby towns. Vita, Sangli, Karad are the nearby by towns to Mahuli having road connectivity to Mahuli.


Temple Address


Kadamba devi Temple,
Mahuli, Sangli District,
Maharashtra, India.

Significance

Devotees visit this temple to seek fulfillment of the following:-

  • Protection from evil
  • Salvation
  • Destruction of ego
  • Liberation
Shlokas

Sarva Mangala Maangalye Sive Sarvaardha Saadhike, Saranye Tryambake Gauri Naarayani Namosthuthe

Meaning -We offer you our salutations, Oh auspicious Naraayani, who is the good of all good, who can achieve everything and can offer refuge, Oh three-eyed Gowri.

Saranaangatha Dheenaartha Parithraana Paraayane Sarvasyaarthi Hare Devi Naaraayani Namosthuthe

Meaning -We offer salutations to you, Oh Narayani, who has the infinite power of creating, preserving and destroying. You are the basis and epitome of the 3 gunas.

Sarvaroope Sarvese Sarvasakthi Samanvithe, Bhayebhyastrahi No Devi Durge Devi Namosthuthe

Meaning -I offer my salutations to you mother Durga, who is present in all beings and has all power, save us from all our wrongdoings O mother of the universe.

Yaa Devi Sarva Bhooteshu Shakthi Roopena Samsthita Namastasyai Namastasyai Namastasyai Namo Namaha

Meaning -Salutations to the Goddess who resides as Shakti in all beings.

Timings

The temple is open from 6AM to 9PM.

तीन- चार नव्हे तर महाराष्ट्रातील 'या' गावात आहेत तब्बल 'इतकी' मंदिरे

सुस्मिता वडतिले

पुणे : महाराष्ट्रात प्रत्येक गावात वेगवेगळी मंदिर आहेत. त्यातील काही प्रसिद्ध मंदिरांना अनेकांनी भेटी दिल्या असतील. पण आपण कधी विचार केलाय का?  एखाद्या छोट्याशा गावात किती मंदिरे असतील? कदाचित चार-पाच किंवा १०- १२. बरोबर ना..? पण एकाच गावात तब्बल १३० मंदिर असतील तर... आहे ना वेगळपणं! सांगली जिल्ह्यात हे गाव आहे. त्या गावाची लोकसंख्या सुमारे ५००० आहे. प्राचीन इतिहास असणाऱ्या या गावाच नाव आळसंद आहे. येथे वेगवेगळ्या देवतांची व प्राचीन मंदिरे आहेत. 'देवळांचे गाव’ म्हणूनच या गावाची ओळख निर्माण होत आहे .

आळसंद गावात प्राचीन इतिहास पाहायला मिळतो. प्राचीन काळात साताऱ्याच्या औंध संस्थानातील हे एक प्रमुख गाव म्हणून ओळखले जात. येथे राजवल्ली पिर व दस्तगिर पिर हे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय नैवेद्य अर्पण करतात. विशेष म्हणजे ही सगळी मंदिरे वेगवेगळ्या देवदेवतांची आहेत. यामध्ये हेमाडपंथीय मंदिरांचाही समावेश आहे. रामदास स्वामींनी ११ मारुतींची मंदिरे या ठिकाणी बांधली. या मंदिरात वेगवेगळया रुपातील आणि भागातील मारुतींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सरस्वतीची मूर्ती या ठिकाणी शिळेवर कोरण्यात आल्याचे आढळून येते.

येथील काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे. सुमारे ३५० वर्षाचे ते जुने आहे. येथील दगडी खांब नक्षीदार आहेत. या ठिकाणी शिव-पार्वती असे पंचमुखी शिवालय आहे. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर, गणपतीचे मंदिर, मायक्का मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर अशी जुन्या काळातील मंदिरे अस्तित्वात आहेत. काही मंदिरे ही २० ते २५ वर्षांमध्ये ग्रामस्थांनी स्वतः ही बांधली आहेत. आळसंदमध्ये या सर्व मंदिरांत मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. कदाचित देशभरातही अशा प्रकारची फार कमी गावे असतील.

आळसंद गावामध्ये जोगूबाई मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदीर, खंडोबा मंदिर, शामराज महाराज मंदिर, सिध्दनाथ मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिर, मरिआई मंदिर, यमाईदेवी मंदिर, जोतिबा मंदिर, राम मंदिर, बिरुदेव मंदिर, ताई आई मंदिर, भवानी मंदिर, वेताळबा मंदिर, दत्त मंदिर, रेणुका मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, बालाजी मंदिर यांसह जुन्या काळातील ३५ ते ४० मंदिरे गावामध्ये आढळतात. या सर्व मंदिराची पुजा अर्चा नित्यनियमाने केली जाते. आळसंद गावात देवांची मंदिरे मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांना जवळपास सर्व देवांचे दर्शन या ठिकाणी होते. त्यामुळे आळसंद गाव हे देवळांचे गाव म्हणून प्रसिध्द होऊ लागले आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात आळसंद हे गाव आहे. या गावात पांढऱ्या मातीचा साठा आहे. आळसंद गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सांगली सुमारे ६६ किलोमीटरवर आहे. आळसंद गावापासून तालुक्याचे ठिकाण खानापूर सुमारे १२ किलोमीटरवर आहे. खानापूर तालुक्यात विटा कुंदल हायवेवरून ११ किलोमीटरवर आळसंद आहे. या गावाची लोकसंख्या पाच हजारच्या आसपास आहे. आळसंद गाव हे "देवळांचे गाव" म्हणून ओळखले जाते.

आळसंदच्या सरपंच इंदुमती जाधव म्हणाल्या, या गावात अनेक लहान मोठी देऊळ आहेत. काही गोष्टी पूर्वजांनी सांगितल्यामुळे गावात इतके देऊळ का आहेत त्याचे कारण अचूकपणे सांगता येणार नाही. गावातील इतक्या सर्व देवळांची देखरेख त्या त्या मंदिरातील ट्रस्ट आणि पुजारी करतात. वर्षातून या गावातील देवांची २४ कार्यक्रम होतात. प्रत्येक देवाची यात्रा असते. त्यावेळी अनेक भाविक दर्शनास येतात.

आळसंदचे महादेव स्वामी म्हणाले, आळसंद हे औंध संस्थानकालिन गाव आहे. ही गोसावीची पंढर आहे. मिनी पंढरपूर म्हणून ओळखले जाते. गावात १३० मंदीरे आहेत. गावातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे. सिध्दनाथ हे गावाचे ग्रामदैवत आहे.

पत्रकार दीपक पवार म्हणाले, आळसंद हे ऐतिहासिक परंपरा लाभलेले गाव आहे. या गावाचा पुर्वी औंध संस्थानमध्ये समावेश होता. मुंगी पैठण (जि. औरंगाबाद) येथून येऊन या ठिकाणी लोक स्थायिक झाल्याचे जुने जाणकार लोक सांगतात. या गावात सात बुरुज व गावाभोवती संपुर्ण तटबंदी असल्याचे आढळते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गावात अनेक जुनी मंदिरे, महाराजांच्या समाधीही येथे पहायला मिळतात. विविध जाती- धर्माचे लोक या ठिकाणी राहत असून सर्व मंदिराची एकत्रित पुजा व धार्मिक कार्यक्रम ते उत्साहाने साजरे करत असतात.

गावातील काही मंदिरे... 

अकरा मारुती मंदिर : हे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे येथील लोक सांगतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिळेवर ११ मारुती, बारावा गणपती व तेरावी सरस्वती आदी देवांची मुर्ती कोरलेली आढळते. असे मंदिर महाराष्ट्रात दुर्मिळ असल्याचेही सांगितले जाते. गावातील हिंदू- मुस्लिम बांधव या ठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात.

काशिविश्वेश्वर महादेव मंदिर : हे मंदिर ४०० वर्षापासून अस्तित्वात असल्याने हे जुन्या काळातील हेमांडपंथी मंदिर असून या मंदिरातील दगडी स्तंभाभोवती कोरिव काम केलेले आढळते. या मंदिरात शिवपार्वती, पंचमुखी शिवालय, महादेवाची पिंड, गणपती, नंदी, कासव या मुर्ती आढळतात.

ओढ्यातील महादेव मंदिर : हे मंदिर ३००- ३५० वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात असून गावच्या ओढ्यामध्ये हे मंदिर उभा करण्यात आले आहे. या ठिकाणी शंकराची पिंड पहावयास मिळते.

ग्रामदैवत नाथबाबा : आळसंदचे ग्रामदैवत असलेल्या नाथबाबा मंदिराची स्थापना सोळाव्या शतकात करण्यात आल्याचे येथील लोक सांगतात. सिध्दनाथांची मुर्ती असलेल्या या मंदिरात शंकराची पिंड व समोरील बाजूस नंदी व कासव यांच्या मुर्ती आहेत. हे हेमांडपंथी प्रकारातील मंदिर असून या ठिकाणचे स्तंभ व दगडावरती कोरीव काम केलेले आढळते. आळसंदमधील जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे.

सती स्वरुपाबाई मंदिर : हे मंदिर ३५० वर्षापासून अस्तित्वात असून या ठिकाणी स्वरुपाबाई नावाची स्री सती गेल्यामुळे हे मंदिर उभे करण्यात आले आहे. या ठिकाणीही शंकराची पिंड व गणपतीची मुर्ती पहावयास मिळते.

गुमानगिरी, लालगिरी व मनषागिरी यांची समाधीस्थळे : सुमारे ३५० वर्षापुर्वी आळसंदमध्ये गोसावी समाजातील गुमानगिरी महाराज, लालगिरी महाराज व मनषागिरी महाराज यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जीवंत समाधी घेतल्याचे येथील लोक सांगतात. या ठिकाणी त्यांची समाधीस्थळे पहायला मिळतात. त्यामुळे पुर्वी या गावाला गोसाव्याची पांढर असेही लोक म्हणत.

ज्ञानेश्वर माऊली मंदिर : हे मंदिर २५ वर्षापुर्वी गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून स्थापन केले आहे. या मंदिरात विठ्ठल -रुक्मिणी मंदिर, संत ज्ञानेश्वर यांच्या मुर्ती असून दरवर्षी या ठिकाणी साप्ताहिक पारायण सोहळ्याचे अयोजन केले जाते.

श्री अष्टविनायक गणेश मंदिर : या मंदिराची स्थापना सात वर्षापुर्वी गावातील दानशूर व्यक्तीमत्व गणपती जाधव (शाहीर) यांनी स्वखर्चातून केली आहे. या मंदिरात गणपती व नंदी य‍ांच्या मुर्ती आहे. आळसंद गावची शोभा वाढवणारे हे मंदिर आहे.

मायाक्का मंदिर : या मंदिराची स्थापना धनगर समाजातील लोकांनी केली आहे. या ठिकाणी मायाक्का देवीची मुर्ती आहे. या मंदिराच्या शेजारी संत बाळूमामा य‍ांची मुर्ती स्थापन करण्यात आली आहे.

लिंगेश्वर महाराज मठ : लिंगेश्वर महाराज हे लिंगदरी (सागरेश्वर अभयारण्य) येथून १९६० मध्ये आळसंद येथे आले होते. त्यावेळी गावातील श्रीपती कुलकर्णी यांनी त्यांच्या मळ्यामध्ये महारांजांना पुजा-अर्चा करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. या ठिकाणी गावातील बबन कुंभार (महाराज) वयाच्या १३ व्या वर्षीपासून सेवेत होते. २० मार्च १९९२ साली लिंगेश्वर महाराज य‍ांनी समाधी घेतली. दरवर्षी लिंगेश्वर महाराज मठामध्ये वसंत पंचमी, अक्कलकोट स्वामी पुण्यतिथी, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, लिंगेश्वर महाराज पुण्यतिथी, बबन महाराज पुण्यतिथी, पारायण सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसदाचे आयोजन केले जाते. या ठिकणी बाहेर गावाहून येणार्‍या भक्तांसाठी भक्तनिवास, वाचनालय आदी सोयी उपलब्ध आहेत. निसर्गरम्य असा या मठाचा परिसर आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा : आळसंद गावच्या वैभवात भर घालणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारुढ पुतळा दगडी चबुतर्‍यावरती बसविण्यात आला आहे. पाठीमागील बाजूस भव्य कमान असलेले गावचे प्रवेशद्वार व दोन्ही बाजूस बुरुज यांचे कोरीव दगडांत बांधलेले आहेत. हा सर्व खर्च ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केलेला आहे.  या गावामध्ये गेल्या तीस वर्षापासून शिवजंयती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त शोभेच्या दारुची भव्य आतिषबाजी, लेझीम व पारंपारिक वाद्यासह मिरवणूक काढण्यात येते.

राजवल्ली पिर व दस्तगीर पिर : राजवल्ली पिर व दस्तगीर पिर हे हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. या ठिकाणी सर्व धर्मीय नैवेद्य अर्पण करतात.

https://www.esakal.com/maharashtra/aalsand-village-maharashtra-famous-temple-village-323304

छत्रपती शिवरायांची शिवकाळातील आणि पुरातन मंदिरे ।। Oldest and First Temples of Chatrapati Shivaji Maharaj

माहिती साभार -  मराठेशाही: प्रवीण भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांवर अनेक मंदिरे बांधली. यामध्ये प्रतापगडावरील भवानी मंदिर, रायगडावरील जगदीश्वर मंदिर, पुरंदरावरील केदारेश्वर मंदिर, रांगणा किल्ल्यावरील रांगणाई मंदिर, वज्रगडावरील मारुती मंदिर, राजगडावरील पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिर ही काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. महाराजांनी अनेक मंदिरे बांधली आणि दुरुस्त देखील केली. हनुमान, भवानी माता, गणेश हे काही मुख्य देवता त्या काळी गडकिल्ल्यांवर होत्या.

छत्रपती शिवरायांची शिवकाळातील आणि पुरातन मंदिरे ।। Oldest and First Temples of Chatrapti Shivaji Maharaj

आपल्याकडे देवाला सोडता अलौकिक कर्तृत्वाने एखाद्या व्यक्तीला देवत्व हे त्याच्या मृत्यूनंतर दिले जाते. आपल्याला अनेक देवाचे अवतार माहीत आहेत मात्र हे अवतार जेव्हा त्यांचे कार्य पूर्णत्वाला नेतात तेव्हाच त्यांना देवत्व प्राप्त होते. मात्र छत्रपती शिवरायांचे दैवत्व हे काहीसे वेगळे आणि अलौकीकच ठरले. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू असतानाचा त्यांना देवत्व प्राप्त झाले होते. फक्त महाराजांचे हयात असताना मंदिरच बांधले गेले नाही तर त्यांची मूर्ती त्या मंदिरात स्थापन करून त्याची पूजा देखील सुरू करण्यात आलेला असल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात आढळतो. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक मंदिरे आपण आज बघतो आहे. आज आपण शिवराय जिवंत असताना  बांधले गेलेले मंदिर कोणते? शिवरायांच्या मृत्यूनंतर मात्र शिवकाळातच बांधली गेलेली महाराजांची मंदिरे कोणती? आणि आधुनिक काळात छत्रपती शिवरायांची बांधली गेलेली मंदिरे कोणती? याविषयी सविस्तर आणि इतिहासाला साक्षी ठेवूनच माहिती जाणून घेणार आहोत.

छत्रपती शिवरायांचे हयातीत असताना बांधले गेलेले पहिले मंदिर

आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवाजी महाराक हयात असताना बांधले गेलेले त्यांचे पहिले मंदिरे हे महाराष्ट्रात नसून कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटकातील धारवाड जवळ असलेल्या यादवाड गावात हे मंदिर आहे. 

मंदिराच्या स्थापनेचा इतिहास

दक्षिण भारताच्या दिग्विजय मोहिमेत म्हणजेच 1678 साली शिवरायांच्या सैन्याला कडवा विरोध करणाऱ्या बेलवाडी येथील मल्लमाँदेवी यांचा पराभव करण्यात आला. छत्रपती शिवरायांनी मल्लमाँ या स्त्री असून देखील शौर्याने लढल्या म्हणून त्यांना माफी दिली. त्यांना त्यांचा मुलुख परत करण्यात आला. मल्लमाँ यांनी दिलेला लढा आणि त्यांच्या पराभवानंतर शिवरायांनी त्यांचा केलेला सन्मान ही कथा आपण नक्की एखाद्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

छत्रपती शिवरायांच्या उपकारांची परतफेड म्हणून मल्लमाँ यांनी बेलवाडी जवळच असणाऱ्या यादवाड येथे एक सुबक आणि देखणी मूर्ती एका घुमटीत स्थापन केली. त्या मूर्तीची नित्यपूजा देखील सुरू करण्यात आली. मंदिराची स्थापना 1678 साली करण्यात आली. 

यादवाड गावातील मारुती मंदिराच्या बाजूलाच ही छोटीशी घुमटी आहे. मूर्तीमध्ये आपल्याला जे शिवराय दिसतात ते घोड्यावर स्वार झालेले आहेत. डोक्यावर एक छत्र धरलेला अब्दागिरी घेतलेला सेवक देखील आहे.  छत्र आणि शेजारी अब्दागिरी ही राजचिन्हे महाराज छत्रपती झालेले असल्यामुळे आहेत. मूर्तीच्या खालील भागात शिवरायांनी एका लहान मुलाला मांडीवर घेतलेले आहे. त्या मुलाला ते दूध पाजत आहेत असे काहीसे शिल्प आहे. शेजारी एक स्त्री आहे आणि तोच मल्लमाँ आहे. मांडीवर असलेले मुल हे मल्लमाँ यांचे आहे. ज्यावेळी मूर्ती स्थापन केली गेली तेव्हा मंदिराप्रमाणे एका छोट्याश्या घुमटीत स्थापून त्याला लाकडी फळ्यांचा दरवाजा बसविला होता. वरच्या बाजूस कळस देखील होता. लाकडी फळ्यांचा दरवाजा काळाच्या ओघात नष्ट झाल्याने आता तिथे जाळीचा दरवाजा बसविण्यात आला. 

घुमटीत असलेली शिवरायांची मूर्ती नित्य पूजेत ठेवल्याने हा ठिकाणाला शिवरायांचे पहिले छोटेखानी का असेना पण मंदिर म्हणायला हवे. 1678 साली हे मंदिर बांधले गेले आणि त्यामुळे महाराजांचे भारतातील सर्वात पहिले मंदिर आहे. मधल्या काळात हे मंदिर जीर्णोद्धार साठी काढले गेले. मूर्तीला त्यावेळी काळजीपूर्वक बाहेर काढली गेली आणि आता पुन्हा तिची प्रतिष्ठापना देखील करण्यात आली. 

इतिहासातील संदर्भ आणि साहित्य

जेष्ठ इतिहास संशोधक कै. ग. ह. खरे यांनी स्वतः यादवाड ला जाऊन स्वतः ही मूर्ती पाहून त्याची माहिती 1956 साली शिवचरित्र वृत्त संग्रहात प्रकाशित केली होती. त्यावेळी या शिल्पाचे छायाचित्र मात्र प्रकाशित केले नव्हते. त्यांचा हाच लेख 1979 च्या बेलवाडी मल्लमाँ यांच्या त्रिशतक स्मरणीकेत कन्नड भाषेत प्रकाशित झाला होता. 

2002 साली कोल्हापूरच्या डॉ वसंतराव मोरे यांच्या छ शिवाजी की साहित्यिक प्रतिमा या हिंदी पुस्तकात शिल्पाचा फोटो आणि माहिती दिली गेली. 

शिवराजेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग किल्ला

यादवाड मधील शिवरायांच्या या पहिल्या मंदिरानंतर जवळपास 17 वर्षांनी म्हणजेच 1695 साली छत्रपती राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात श्री शिवराजेश्वर मंदिर बांधले. म्हणजे शिवरायांच्या निधनानंतर 15 वर्षांनी हे मंदिर बांधले गेले. हे शिवराजेश्वर मंदिर बांधल्यानंतर त्यात शिवरायांची मूर्ती स्थापन करून तिची विधिवत पूजा सुरू केली.  या मंदिराला आपण महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे सर्वात पहिले मंदिर म्हणून ओळखतो. 

खुद्द महाराजांचे पुत्र असलेल्या राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधलेले असल्याने याला महत्व आहे. मंदिराचा पुढील सभामंडप कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 1906 मध्ये बांधला होता. 

मंदिरातील शिवरायांची मूर्ती एक वेगळ्या रुपात आहे. मंदिर स्थापनेवेळी सुरू केलेली पूजाअर्चा आजतागायत अखंड पणे सुरू आहे. या मूर्तीविषयी अधिक माहिती लवकरच देत आहोत.

आधुनिक काळातील छत्रपती शिवरायांची मंदिरे

कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवरायांची 2 मंदिरे बांधली. एक मंदिर पन्हाळगडावर बांधले तर दूसरे मंदिर नर्सरी बागेत बांधलेले आहे. 1908 साली बांधलेली मंदिरे ही महाराष्ट्रातील शिवरायांची आधुनिक काळातील पहिली मंदिरे आहेत.

पन्हाळगडावर असलेले मंदिर छोटेखानी असून त्यात शिवरायांची संगमरवरी अश्वारूढ मूर्ती आहे. 

एखाद्या गावाने मिळून बांधलेले शिवरायांचे पहिले मंदिर म्हणजे रांजनी (तालुका कौठे महांकाळ, जिल्हा सांगली) गावातील आहे. 1976 आणि 77 या काळात हे मंदिर बांधले आहे. 

छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र, श्रीशैलम मल्लिकार्जुन

श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन मंदिराच्या उत्तरेला काही अंतरावर छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र बांधलेले आहे. आधुनिक काळात हे बांधकाम करण्यात आलेले आहे. 1974 च्या सुमारास ही वास्तू बांधण्यास सुरुवात करण्यात आली. आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र शासन दोघांनी मिळून ही इमारत बांधलेली आहे. मंदिरात छत्रपती शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा आहे. मंदिरात ऐतिहासिक माहितीचे फलक देखील आहेत. शिवछत्रपतींचे हे आंध्रप्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध स्मारक आहे. 

कधी तुम्ही श्रीशैलम येथे गेला तर हे स्मारक नक्की बघा. 

या सर्व महत्वाच्या मंदिरांव्यतिरिक्त अनेक शिवरायांची मंदिरे स्वतंत्र पणे उभारली जात आहेत. अनेक मंदिरांच्या शिखरांवर देवांसोबत छत्रपती शिवरायांची देखील मूर्ती आपल्याला बघायला मिळते. शिवरायांना देव म्हणावे की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो मात्र याचे उत्तर अगदी सोपे आहे, ज्या मनुष्याला जिवंतपणीच दैवत्व प्राप्त झाले होते त्याचे दैवत्व नाकारणारे आपण कोण? एकवेळ एखादा नास्तिक देवाचे अस्तित्व नाकारेल परंतु ज्याने संपूर्ण देशाला एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून परकीय लुटीतून जाचातून मुक्त केले त्याला तर नास्तिक देखील देवच म्हणेल.

https://www.garvanemarathi.com/2022/02/Shivaji-maharaj-temples-marathi.html
निवृत्त वायुसैनिक आणि वस्तु सेवा कर अधिकारी12 फेब्रु

महर्षी अगस्ती (नामभेद: अगस्त्य, मैत्रावरुणी, अगस्ति;) हे वेद वाङ्‌मयामध्ये वर्णिलेले ‘मंत्रद्रष्टा महर्षी’ होत. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्तिपरंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्धपुरुषांच्यापैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. सप्तर्षींपैकी मुख्य मानले जाणारे भगवान श्री अगस्त्य हे वसिष्ठ ऋषींचे वडील बंधू होत. भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारात भगवान अगस्त्यांचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.

‘अगस्त्य’ हे भगवान परमशिवांचेदेखील एक नांव असल्याने अगस्ती मुनी हे परमशिवस्वरूप असल्याचे मानले जाते. ‘अगस्त्य’ ह्या नांवाव्यतिरिक्त त्यांस तमिळमुनी, माधवमुनी, महामुनी, कुरुमुनी, तिरुमुनी, बोधीमुनी, अमरमुनी, कुडमुनी, कुंभज, कुंभसंभव, घटोद्भव ही नामाभिधाने प्राप्त आहेत. अशा अगस्त्य महर्षींचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (३००० इ.स.पूर्व) ला काशीमध्ये झाला. मित्रावरुण हे त्यांचे पिता होत. ऋग्वेदामध्ये (संदर्भ: ७/३३/१३) त्यांच्या जन्मकथेचे वर्णन येते. वर्तमानकाळांत काशीक्षेत्रातील त्यांचे जन्मस्थान श्रीअगस्त्यकुंड ह्या नांवाने प्रसिद्ध आहे.

भारतवर्षात तसेच इतरत्रदेखील, अगस्त्यकूट, अगस्त्यपुरम, अगस्त्यतीर्थ, अगस्त्यगिरी, अगस्त्यवटम्, अगस्त्यसरस्स्, अगस्त्याश्रम, अगस्तीश्वरम ह्यासारखी ह्या महर्षींच्या नांवाने आरंभ होणारी विविध स्थळांची नांवे ही त्यांच्या चतुरस्र चरित्ररेखेची साक्ष देणारी ठरावीत. महर्षींचे भारतवर्षामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातील काही मुख्य आश्रम उत्तराखंड,रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर, महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात प्रवरानदीच्या काठावर, आंध्रप्रदेश (तिरुपती), तमिळनाडू , चेन्‍नईजवळ अगस्त्यकूट पर्वतावर ह्या ठिकाणी आहेत. त्यांसह इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी ठिकाणीही ह्यांचे पूजन केले जाते. आकाशाच्या ईशान्य कोपऱ्यात उगवणारा तारा (Canopus) हा पौरस्त्य ज्योतिषशास्त्रात ‘अगस्तीचा तारा’ म्हणून गणला जातो, हा भगवान श्री अगस्त्य महर्षींच्या व्यक्तिरेखेचा गौरवच आहे.

अगस्ती ऋषींचे एक दुर्मिळ आणि पिंपळाच्या मुळ्यांनी वेढलेले एक लहानसे पण अदभूत मंदिर सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील तामखेडी या गावात आहे. तसे हे मंदिर गावात नसुन गावाच्या शिवारात असल्याने, दुसऱ्या आडसरवाडी या गावाकडून पण जवळ आहे.

या मंदिराबद्दलची आख्यायिका अशी सांगितली जाते की, जेव्हा अगस्ती ऋषी काशीहून दक्षिणेकडे प्रवास करीत होते, तेव्हा काही काळासाठी त्यांनी येथे आश्रम उभारून वास्तव्य केले होते. त्याच वेळेस प्रभु रामचंद्र सुद्धा या ठिकाणी आले. त्यावेळी अगस्ती ऋषी प्रभु रामचंद्र यांना बाणांचा भाता दिला, त्या भात्यातील बाण कधीच संपणार नाही, असे वरदान दिले. येथेच अमोघ अस्त्र पण प्रभु रामचंद्राला दिले होते.

येथून अग्रणी नावाची नदी उगम पावते. या मंदिराबद्दल पंचक्रोशीतील नागरिक सोडले तर हे मंदिर तसे अपरिचित आहे. गत काळात काही समाज माध्यमात कार्यरत असल्याने हे मंदिर प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या मंदिरामुळेच ऊस कारखान्याचे अगस्ती कारखाना असे नामकरण झाले आहे.

मंदिराला जायला मुख्य रस्ता म्हटले तर विजापूर हम रस्ता जवळ आहे. हे मंदिर एका शेतात आहे. आडसरवाडी किंवा तामखेडीपासुन मंदिराकडे जायला कच्चा रस्ता सुद्धा नाही. आपण ज्याला गाडीवाट म्हणतो, असा लाल मातीचा रस्ता आहे. मोटर सायकल पण शेताच्या बांधावर उभी करावी लागते. दूरवरून पिंपळाचे झाड आणि त्याखाली असलेले मंदिर दृष्टीस पडले की आत्मिक समाधान मिळते. त्यानंतर पाच ते दहा मिनिटे शेतातून चालत मंदिराजवळ पोहचता येते.

मंदिर पूर्णपणे पिंपळाच्या मुळ्यांनी वेढले गेले आहे. दरवाजा सुद्धा चारही बाजूंनी मुळ्यांनी वेढला असला तरी अडथळा नाही.

असे हे एक दुर्मीळ मंदिर आहे.

 https://mr.quora.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3-%E0%A4%9C%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0

 

 

स्तंभेश्वर महादेव मंदिर :-

भारतातील मंदिरे जगभर प्रसिद्ध आहेत. मंदिरांची सजावट, त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा आणि मूर्तींची रचना भक्तांना आश्चर्यचकित करण्याची संधी सोडत नाही. आतापर्यंत आपण अनेक प्राचीन मंदिरे आणि त्यांच्याशी संबंधित कथा ऐकल्या असतील. काही मंदिरे प्राचीन काळातील काही रहस्यांमुळे प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहेत. गुजरातचे असेच एक खास मंदिर त्याच्या रहस्यमय चमत्कारासाठी खूप प्रसिद्ध आहे. आपण त्या मंदिराची माहिती बघू या;

छायाचित्र : गुगल

याला भगवान शिव - शंकराचे चमत्कारिक मंदिर म्हणून ओळखले जाते.

भारतात भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. गुजरातचे स्तंभेश्वर महादेव मंदिर आपल्या रहस्यमय चमत्कारासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वास्तविक रहस्य म्हणजे , हे भगवान शंकराचे मंदिर दिवसातून दोनदा आपल्या भक्तांना दर्शन दिल्यानंतर समुद्राच्या कुशीत निद्रिस्त होते.

हे असे अदभुत मंदिर गुजरातच्या कावी-कंबोई गावात आहे. हे गाव अरबी समुद्राच्या मध्यभागी कळंबेच्या किनाऱ्यावर आहे. हे रहस्यमय मंदिर दिवसातून फक्त दोन वेळा, सकाळ आणि संध्याकाळ दिसते.

शिवभक्तांना दर्शन दिल्यानंतर हे मंदिर समुद्रात नाहीसे होते. असे म्हणतात की हे मंदिर कोणाच्यातरी प्रायश्चिताचे फळ आहे, याचा उल्लेख शिवपुराणातही आहे आणि याच कारणामुळे ते नाहीसे होते.

मंदिराची माहिती :-

शिवपुराणानुसार, तारकासुर नावाच्या एका शिवभक्ताने, असुराने आपल्या तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न केले. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या बदल्यात त्याला इच्छित वरदान दिले. ते वरदान असे होते की त्या असुराचा वध फक्त भगवान शंकर यांचा पुत्रच करू शकतो, आणि त्या पुत्राचे फक्त सहा दिवस असेल. भगवान शंकराला तर पुत्र नव्हता. त्यामुळे तारकासुर स्वतःला चिरंजीवी समजु लागला.

तारकासुराला वरदान मिळाल्याने शिवपुत्र सोडून कोणीही त्या राक्षसाचा वध करू शकत नव्हते. हे वरदान मिळाल्यावर तारकासुरने तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला. यामुळे व्यथित होऊन सर्व देव आणि ऋषींनी भगवान शंकराला तारकासुराचा वध करण्यासाठी प्रार्थना केली. देवांच्या प्रार्थनेचा स्वीकार केल्यानंतर, पांढर्‍या पर्वत तलावातून 6 दिवसांच्या कार्तिकेयाचा जन्म झाला. कार्तिकेयाने त्याचा वध केला होता, पण नंतर तो असुर निस्सीम शिवभक्त असल्याची माहिती मिळाल्यावर कार्तिकेयला खूप पश्चाताप झाला.

मंदिर हे प्रायश्चिताचे फळ आहे …!

जेव्हा कार्तिकेयाला त्याचा पश्चाताप झाला तेव्हा त्याने भगवान विष्णूला प्रायश्चित्त करण्याचा मार्ग विचारला. यावर भगवान विष्णूंनी त्यांना रोज क्षमा मागावी लागेल अशा ठिकाणी शिवलिंग स्थापन करण्याचा उपाय सुचवला. अशा प्रकारे त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. तेच पुढे स्तंभेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.

छायाचित्र : गुगल

हे मंदिर दररोज समुद्रात बुडते आणि नंतर परत वरती येते. आपल्या कृत्याची क्षमा कार्तिकेय मागायचा आणि मंदिर समुद्रात डूबयाचे. आज देखील तसेच घडत असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक महाशिवरात्री व अमावस्येला स्तंभेश्वर महादेव येथे मोठी यात्रा भरते. या मंदिराला भेट देण्यासाठी पूर्ण दिवसाची वेळ निश्चित करावी, जेणेकरून हा अदभुत चमत्कार पाहता येईल.

 

मेथी सिंदखेड धुळे मंदीर


 
 https://www.indianetzone.com/47/tourism_dhule_district.htm
 
 






खानदेशातील धुळे जिल्हयात अनेक प्राचीन मंदीरे आहेत. निजामपुर आणि शिरुड गावातील मंदीरांना भाविक मोठ्या प्रमाणात भेट देतात. याशिवाय अमली येथील विष्णु मंदीर, चिकसे येथील गंगाधरेश्वर मंदीर, इण्दावे येथील प्राचीन मंदीर, तापी आणि पांजरा नदीच्या संगमावर वसलेल्या मुडावद गावचे अहिल्याबाई होळ्करांनी बांधलेले कपिलेश्वर मंदीर, पांजरा नदीच्या डाव्या तीरावरचे नागपुर कोकाळे गावचे नागई मंदिर अशी प्राचीन मंदीरे आहेत.
           मेथी ता. सिंदखेडा जि.धुळे या गावी मंदीराचा समुह आहे. यातील लक्ष्मी आणि नारायणाची मंदीरे आहेत. हि दोन्ही मंदीरे अनेक अर्थाने अद्वितीय आहेत. हि दोन्ही मंदीरे शेजारी असून १.८२ मीटर उंच जगतीवर उभी आहेत. मंदीरात प्रवेश करण्यासाठी दोन्ही मंदीरावर पायर्या आहेत. नारायण मंदीरासमोर गरुड असलेला मंडप होता हे दाखविण्यापुरते अवशेष शिल्लक आहेत. या मंदीरापैकी लक्ष्मी मंदीर काहीसे लहान असून त्याचा मंडपही जरा वेगळ्या प्रकारचा आहे. 












 
दोन्ही मंदीरांचा तलविन्यास  मुखमंडप, मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा आहे. लक्ष्मी मंदीराच्या मंडपाला पुर्ण भिंती आहेत. तर नारायण मंदीराचा मंडप अर्धखुला आहे. नारायण मंदीराच्या बाह्यांगावर वैष्णव मुर्ती आहेत.मात्र बांधकामासाठी वापरलेला प्रस्तर निकृष्ट प्रतीचा असल्यामुळे या मुर्तींची कमालीची झीज होउन त्यातील मुर्तीशास्त्रीय तपशील नाहीसे झाले आहेत. लक्ष्मी देवीच्या मंदीरातील मुर्ती आणि तीच्या प्रभावळीत दाखवलेल्या नउ दुर्गावरुन हि मुर्ती कोल्हापुरच्या महालक्ष्मीसारखी असावी हे स्पष्ट होते. विष्णु, शिवपार्वती, लक्ष्मी (करंडक मुकुट धारण करून पद्मासनात आहे)तसेच शेषनागावरील विष्णु अवतार अश्या अतिप्राचीन मुर्ती या मंदिरात आहे.मंदिरातील शेषनागावरील विष्णु अवतार हि मुर्ती खानदेशात फक्त दोन ठिकाणी आहे असे म्हटले जाते, त्या पैकी मेथी गावातील हि एक मुर्ती.
या मंदीराच्या शैलीवरुन हे मंदीर इ.स. १२ व्या शतकात बांधले गेले असावे. धुळे शहरापासुन अवघ्या ४६ किलोमीटर वर मेथी हे गाव वसलेले असुन येथील अतिप्राचीन मंदिरांना अवश्य भेट द्या.

प्राचीन मेथी मंदिर समूह, ता. शिंदखेडा जि.धुळे

खान्देशातील मेथी ह्या गावात यादवकालीन मंदिरांचा समूह आढळतो. त्यापैकी बालाजी मंदिर व भवानी मंदिर हे मुख्य मंदिर सुस्थितीत असून काही अंतरावर शेषशायी विष्णू मंदिर व हेमाडपंथी महादेव मंदिर देखील आहे. सदरील मंदिरांचा कालखंड अकराव्या शतकातील सांगितला जातो. शेषशायी विष्णू मंदिरात उमा महेश्वर तसेच ब्रम्ह मूर्ती आहे, मंदिरच्या समोरील बारव / पुष्करणी वैशि्टयपूर्ण असून तीनही बाजूने प्रवेश - प्रत्येक बाजूला तीन तीन अशी एकूण बारा देवकोष्ठे असावी (पडझड झालेली ) त्याचप्रमाणे वरील संरक्षक भिंतीच्या पातळीवर स्वतंत्र अशी एकगर्भी शिखरयुक्त मंदिरे दगडी स्वरूपात बांधली गेलेली आहे. दुर्दैवाने सदरील बारव बुजवून त्याचे लहान कुंडात रूपांतर करण्यात आले आहे.














हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव | Discover Maharashtra

Discover Maharashtra

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव –

खानदेशातील पाचोरा तालुक्यात अजिंठा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले टुमदार गाव म्हणजे पिंपळगाव हरेश्वर. साधारणत: तीस हजार लोकवस्तीचे हे गाव व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. डोंगर पायथ्याची कसदार जमीन ,बऱ्यापैकी जलसाठा, पोषक वातावरण त्यामुळे फळबागा क्षेत्रात या गावाचा चांगलाच लौकिक आहे .बहुळा आणि डुब्बा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने या गावाला विशेष धार्मिक, ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व पण आहे.(हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव)

पुराणात भस्मासुराची एक कथा सांगितली जाते.ती अशी की, दररोज चितेचे ताजे भस्म मिळावे म्हणून शिवशंकरांनी एका बालकाची नियुक्ती केली होती. एकदा भस्म न मिळाल्याने चितेतले  निखारेच तो घेऊन आला .त्याचे हात पोळले. त्याच्या एकनिष्ठ पणावर शंकर प्रसन्न झाले व भस्म शोधण्यासाठी तुझी वणवण होणार नाही म्हणून तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल असा त्याला वर दिला. परंतु त्याचा दुरुपयोग करू नकोस असा सल्ला पण दिला.

काही दिवस सर्व व्यवस्थित सुरू असताना त्याच्या मनात अहंकार शिरला. त्याला त्याच्या शक्तीचा गर्व चढला आणि तो वाटेल त्याचे भस्म करू लागला. त्याच्या असुरी शक्ती जागृत झाल्या. तो भस्मासुर म्हणून कुख्यात झाला. त्याने भूतल त्राही त्राही करून सोडले. आपल्या शक्तीने आपण कुणालाही परास्त करू शकतो असा उन्मत्त भाव त्याच्या मनात जागृत झाला.

एके दिवशी तो शंकराच्या च्या पाठीमागे लागला. त्यांनी कैलास सोडला. भस्मासुराची व त्यांची दृष्ट भेट झाली ती पाचोरा येथील पाताळेश्वर परिसरात. शंकर तेथून उत्तरेकडे बहुळाच्या दिशेने निघाले .बहुळेच्या काठी त्यांनी भैरवांना वर दिला. खेड्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना तिथेच थांबवले. ते स्थान वरखेडी म्हणून प्रसिद्ध झाले. सावखेड्याच्या पुढे गेल्यानंतर ते गुप्त झाले. ती जागा गुप्तेश्वर महादेव म्हणून ओळखली जाते.

येथील मंदिराचे वैशिष्ट्य असे की, येथे शिवपिंड नाही. पाषाणालाच शाळुंखेचा नैसर्गिक आकार असून त्यातून जिवंत पाण्याची धार सतत वाहत असते. पूर्वी ती झऱ्यासारखी वाहत असे. आता थोडाफार ओलावा दिसतो. भस्मासुर शंकराचा पिच्छा पुरवत तिथपर्यंत आला.

शंकर भोजे परिसरात रुद्रेश्वर येथे प्रकट झाले. येथील मंदिरात शंकराची भलीमोठी पिंड आहे. ही पूर्णपणे चिखल गाळात रुतलेली होती. मंदिर भग्न झालेले होते. गावकऱ्यांनी खोदकाम करून ती मोकळी केली व नवीन मंदिर निर्माण केले. या परिसरात प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडतात.( येथील रुद्रेश्वर मंदिराविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)

भस्मासुर रुद्रेश्वर स्थानापर्यंत पाठलाग करत आला. त्यामुळे शंकरांनी पूर्वेकडे बहुळेच्या काठाने बहुळा व  डूबा या संगमावर विश्रांती घेतली. शंकरांचा पिच्छा पुरवत भस्मासुर तिथे जाऊन पोहोचला. शंकरांची अशी अवस्था पाहून विष्णूने मोहिनी रूप धारण केले व भस्मासुराला या संगमावर रोखून धरले .शंकर बहुळेच्या काठाने थेट अजिंठा पर्वत रांगेत तिच्या उगमापर्यंत जाऊन पोहोचले. तिथून त्यांनी मागे वळून पाहिले. म्हणून या जागेला मुरडेश्वर असे नाव प्राप्त झाले .

शंकरांनी मागे वळून पाहिले तर काय ,एक सुंदर ललना भस्मासुराला मोह पाशात अडकवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होती .मोहिनीने नृत्य प्रारंभ केले व आपल्या तालावर भस्मासुराला नाचायला भाग पडले. नृत्यात तल्लीन झालेल्या मोहिनीने आपला एक हात डोक्यावर ठेवला. तिचे अनुकरण करत भस्मासुराने देखील आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्या क्षणी तो धाडधाड पेटत जमिनीवर कोसळला. त्याचा अंत झाला.                               विष्णूने मोहिनी रूपाचा त्याग केला. ते  आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. शंकरांनी हर्षातिरेकाने त्यांना मिठी मारली. दोघांची कडकडून गळाभेट झाली.

हा प्रसंग जेथे  घडला ते स्थान म्हणजे हरिहरेश्वर मंदिर होय. आता या आख्यायिकेतील महत्त्वाचा भाग बघू .पाचोर्‍यातील पाताळेश्वर ते अजिंठा पर्वतरांगेतील मुर्डेश्वर असा शंकरांनी केलेला प्रवास हा मध्य काळापर्यंत व्यापारी मार्ग होता .मराठवाड्यातील व्यापारी घाटमाथ्यावरचा माल जोगेश्वरी मुर्डेश्वर येथील घाटातूनच खाली उतरवून खानदेशात प्रवेश करत असत.      आजही सावखेडा येथील भैरवनाथ यात्रेत मराठवाड्यातील गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

येथील भैरवनाथाला सव्वाच्या पटीत गुळाचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. मुर्डेश्वर ,हरिहरेश्वर, रुद्रेश्वर या मंदिरांचे प्राचीनत्व व तेथील दगडी शिल्पे इतिहासात डोकवायला भाग पाडतात.

या आख्यायिकेतील अजून महत्त्वाचा भाग म्हणजे  भस्मासुराचे मागे लागणे आणि शंकराचे पलायन ही प्रतीकात्मक रूपे आहेत. जीवनात अनावश्यक संकटे मागे लागली की प्रत्येकाला तोंड देत शक्ती विनाकारण वाया न घालवता त्यापासून माघार घ्यावी लागते .ही यशस्वी माघार असते. अनेक महापुरुषांनी अशी यशस्वी माघार घेतल्याचे दिसून येते.

कुवत नसताना प्रचंड शक्ती हाती आली की व्यक्ती किती पाशवी वर्तन करू शकते याचे उदाहरण म्हणजे भस्मासूर होय. व्यक्ती कितीही सामर्थ्यशाली असली तरी स्वतःचा विवेक गहाण ठेवून दुसऱ्या च्या तालावर नाचू लागली की त्याची फलनिष्पत्ती काय होते हे भस्मासुर कथेतून शिकायला मिळते.

अविवेकी अनिर्बंध वर्तनाला वेसण घालण्यासाठी शांत संयमी व विवेकशील बुद्धिने घेतलेला निर्णय म्हणजे विष्णूचे मोहनी रूप होय. मानवी वर्तनाच्या प्रत्येक निकषावर या कथा घासून पहिल्या तर त्यातील यथार्थता लक्षात येते. खुळचट आणि अनैतिहासिक म्हणून त्यांची हेटाळणी करण्यापेक्षा मानवी व्यवहाराचे ते एक निष्कर्ष आहे असे मानले तर या कथा त्रासदायक ठरत नाहीत.        हरी आणि हर यांची भेट म्हणजे शैव आणि वैष्णव या संप्रदायांचे मनोमिलन आहे .त्यांच्यातील समन्वय सांस्कृतिक इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना आहे .त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक भाव धारेत आढळून येते. हा समन्वय प्राचीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासात खूपच मोलाचा ठरला .

पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर निर्मितीचा कालखंड पूर्व पेशवाई कालीन असावा याबाबत मते मतांतरे आहेत. मंदिराच्या पायऱ्या व घाट निर्मितीचा कालखंड शके1841 म्हणजे 1919 असा आहे. येथील पायरी लेख हा जगातील सर्वात लांबीचा शिलालेख आहे .

या शिलालेखाचे वाचन, हस्तलिखित संशोधन विभाग ,दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र भारत सरकारचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गांधी संशोधन केंद्राचे समन्वयक श्री भुजंगराव बोबडे यांनी केले आहे. या शिलालेखाची लांबी 15 मीटर नऊ इंच रुंदी 9 इंच आहे. शिलालेखांची भाषा मराठी असून लिपी देवनागरी आहे. भुजंगराव बोबडे व शेंदुर्णी येथील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी या शिलालेखाचे वाचन केले आहे.

ते पुढील प्रमाणे ….।। ओम श्री हरिहरेश्वराय नमः या फरशी चे काम शके१८४१ मध्ये झाले. त्यात मेहनत व लक्ष घालणारे सद्गृहस्थ मे. मामलेदारसो. श्रीधर आर.टी. देव जहागीरदार सीताभ्रतार श्रीधर यांच्यातर्फे मुखत्यार रामभाऊ रामचंद्र जोशी यांनी जहागिरीचे उत्पन्नातून खर्च रुपये २५००शे केला. जमाखर्च लिहिण्याचे काम रा नथू कुंता पाटील यांनी केला. बाकी कामात लागणारी सर्व सिद्धता व देखरेक देवराज मरडाजी पाटील यांनी केली. कारागीर कुऱ्हाडकर रामभाऊ, दगडू शिंपी, व. द. पंचाळ, ब्राह्मण व मंडळी, दगड पाडणारे पांडू गोविंदा माळी व मंडळी ।।  ।। देह त्यागिता किर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।। श्री समर्था चे म्हणण्यावरून पुढे रा —केल्या कामास कोणी आश्रय देतील अशी आशा आहे. रा. त्यांनी वाड्यातील— फरशी चे प्रमुख खर्चाने केला. लेखक केशव दगडू मिस्त्री पतर दिले.

हा शिलालेख पायरीच्या अनेक दगडांवर कोरून एकाच रांगेत बसवला आहे. त्यामुळे याला पायरी लेख असे नाव दिले गेले. पायर्‍या चढून वर आले की उजव्या बाजूला एक सात फूट उंचीचा अखंड पाषाण रोवलेला आहे. त्यावर एक आकृती आसन घालून बसलेल्या अवस्थेत कोरलेली दिसते. या पाषाणाला भस्मासुर म्हणतात. तिथून मंदिराचा बाह्य परकोट सुरू होतो. त्याची उंची साधारण 28 फूट आहे. परकोटा चे बांधकाम चारही बाजूंनी बंदिस्त आहे. आत जाण्यासाठी एकच मुख्य दरवाजा आहे. त्या समोर घाट पायरीवर भला मोठा नंदी लक्ष वेधून घेतो.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला सुंदर दगडी महिरपीत कोरलेल्या छत्र्या नजरेत भरतात. पाटणादेवी येथील भास्कराचार्य व त्यांची कन्या लीलावती यांच्या समाध्या पिंपळगाव येथील हरेश्वर मंदिरात पाहिल्याने आश्चर्य वाटले.( याविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.) पिंपळगाव हरेश्वर येथील भास्कराचार्यांची समाधी पाच बाय पाच फूट उंचीच्या चौथर्‍यावर उभारली आहे. त्याला आधार देण्यासाठी चार फूट उंचीचा चौकोनाकृती ओटा बांधला आहे. सुंदर कोरीव काम केलेल्या चार दगडी स्तंभावरील नक्षीकाम साधे असले तरी महिरप सुंदर आहे .त्यावर दगडी छत आकर्षक रित्या बसवले आहे .छतावरील घुमटाकार कळस अलीकडे बसवला असावा.

या संपूर्ण मंदिराला स्थानिक गावकऱ्यांनी रंगरंगोटी करण्यापूर्वी सिमेंट व नर्मदा रेतीचे लिंपण केले आहे .त्यामुळे मंदिर पेशवेकालीन वाटण्याऐवजी अलीकडच्या काळातच बांधले याचा भास होतो. पाषाणावरील कोरलेली शिल्पे किंवा पानाफुलांच्या आकृती सिमेंटच्या अतिरेकी माऱ्यात धाराशयी पडल्याचे स्पष्टपणे दिसते .जीर्णोद्धार कर्त्यांनी फक्त मजबूतीकडे लक्ष दिले. त्यात एक समृद्ध वारसा आपल्याकडून कायमचा पुसला जातो याचेही भान मंडळींना राहिले नाही.

भास्कराचार्य यांच्या बाजूला असलेली लीलावती यांची समाधी मात्र अलीकडच्या काळात बांधली गेल्याचे स्पष्टपणे दिसते. या समाधीच्या शेजारी नंदीमंडप असून स्वतंत्र नंदीची मुर्ती त्यात सुशोभित आहे. नंदीच्या गळ्यातील घंटांची माळ पाठीवरून  शेपटीपर्यंत दर्शवली आहे. दोन बालिका आकृती नंदीच्या गळ्यातील घंटा वाजवताना चित्रित केल्या आहेत. नंदीमंडपाचे चारही खांब दगडी कोरीव कामाने सुशोभित केल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यावरील जोतरे व तुळया लक्ष वेधून घेतात. नंदी मंडपाला आधार देण्यासाठी अलीकडे सिमेंटचे बांधकाम करून मजबूत केल्याचे स्पष्टपणे जाणवते. येथे नंदीमंडप स्वतंत्रपणे उभारला आहे. मंदिराच्या सभागृहात प्रवेश करताना दोन दगडी स्तंभावरील कलश व पाने लक्ष वेधून घेतात. त्याच्या बाजूला अलीकडच्या काळात गणपती मंदिर बांधून त्यात सुबक श्री गणेशाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित केली आहे.

सभागृहात प्रवेश केल्यावर वितानाची उंची व गाभाऱ्याची भव्यता नजरेत भरते. अलीकडे केलेले सिमेंटचे काम व रंगकाम यामुळे आपण चित्रपटातील एखादा थर्माकोलचा सेट पाहतोय की काय असा भास होतो. सभागृहाच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत पण त्यातील मूर्ती मात्र नाहीशा झालेल्या आहेत. सभागृह व गर्भगृह यातील अंतरिक्ष आठ दगडी खांबांवर तोललेला आहे. सभागृहातून प्रवेश केल्यावर सुद्धा शिव पिंडी चे दर्शन होत नाही हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

महाद्वारा वरील नक्षीकाम पानाफुलांचे असले तरी पायथ्याला यक्ष किन्नर गंधर्व मूर्ती स्पष्टपणे दिसतात. अंतरिक्षाच्या उजव्या कोनाड्यात गणपती मूर्ती चटकन लक्षात येत नाही. ती फारच सुंदरआहे. महाद्वाराच्या उंबरठ्यावर आल्यावर गर्भगृहातील शिवपिंडीचे वरतून दर्शन होते. आठ ते नऊ पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. येथील शिवपिंडी विलोभनीय आहे .संपूर्ण गर्भगृहाला आतून संगमरवरी बांधकाम केले असून पुरेशी विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्थित घेता येते. येथील गर्भगृहाची खोली अन्य शिवमंदिरापेक्षा अधिक आहे. येथील शिवपिंडीवर नित्य पूजाअर्चा व नैवेद्याचा मान गुरव घराण्याकडे सोपवला आहे.

येथील पिंडी चे वैशिष्ट्य म्हणजे शाळुंखे वरील लिंगाचे दोन भाग स्पष्टपणे दिसतात .त्यापैकी अर्धा भाग विष्णू स्वरुप तर अर्धा शिव स्वरूप मानला जातो. विष्णू स्वरूपाला तुळस तर शिव स्वरूपाला बेलपत्र वाहण्याचा प्रघात आहे. एकाच पिंडीवर शिव आणि विष्णू यांची पूजा एकाच वेळी केली जाते. अशी ही खानदेशातील आगळीवेगळी परंपरा येथे पाहायला मिळते. कारण भस्मासुर वधानंतर याच ठिकाणी शिव आणि विष्णू यांची गळाभेट झाली होती. म्हणून शैव आणि वैष्णव परंपरांचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो.

आषाढी व शिवरात्रीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते .चार वर्षांपूर्वी या पिंडीवर वज्रलेप चढवण्यात आला. गर्भगृहात रिकामे देव कोष्टक आहे. त्या वरील दगडी नक्षीकाम वाघळी येथील मुधाईदेवी मंदिरातील देव कोष्टकांत सारखेच आहे. गर्भगृहाचे वितान सुमारे पंचवीस फूट उंचीची असून त्यावर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे व पंख्यांची सोय केल्याने वायुविजनाची सोय झाली आहे.

बाहेरच्या बाजूला गणपती मंदिरा शेजारी एक गोलाकार दगडी बाणा बसवलेला दिसतो. शेगावचे संत श्री गजानन महाराज येथे दर्शनासाठी आल्यावर याच ठिकाणी ध्यान मुद्रित आसनस्थ होते असे सांगितले जाते. मंदिर गर्भगृहाचे बाह्य काम नागर शैलीतील आहे. त्यावर उडीसा मंदिर शैलीचा स्पष्टपणे प्रभाव जाणवतो. शिखरावरील कळस मात्र चौकोनी असून त्यावर गोलाकार घुमट चढवला आहे. त्याची रचना केदारनाथ मंदिर शिखर सदृश्य असल्याचा भास होतो. मंदिराच्या बाह्य भागावर तीनही बाजूंनी देवकोष्ठके आहेत परंतु त्यात मूर्ती मात्र नाहीत. कदाचित त्यांची झीज झाली असावी.

पाठीमागे नरसिंह प्रकट व हिरण्यकश्यपूचा वध अशी दोन स्वतंत्र शिल्पे आढळतात. त्यावर कीर्तिमुख कोरलेला आहे तर उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनीची आकृती स्पष्टपणे दिसते. त्या खालील मूर्तीची पूर्णपणे झीज झाल्याने मूर्ती ओळखता येत नाही. मंदिर पाठीमागे सुंदर कमळ फुले मन वेधून घेतात. त्यासाठी खास पुष्करणी तयार केलेली आहे. त्यात गुलाबी, पांढरे ,गर्द निळे, जांभळे अशा विविधरंगी कमळ फुलांचा ताटवा डोळ्यांचे पारणे फेडतो.

पिंपळगाव गावापासून साधारणता दीड किलोमीटर अंतरावर असलेले हरिहरेश्वर मंदिर हे खानदेशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे .त्याला पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ आहेत. संत गोविंद महाराज यांची समाधीदेखील याच गावात आहे.( त्यांचे विषयी स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)

गावातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी अलीकडे स्वतंत्र सिमेंटचा रस्ता बनवल्यामुळे भाविक तसेच पर्यटकांना जाणे सुलभ झाले आहे. पावसाळ्यात हा परिसर फारच रम्य भासतो. लोकप्रतिनिधींनी व इतिहास अभ्यासकांनी या मंदिरातील सर्वात लांबीच्या शिलालेखाची गिनीज बुक मध्ये नोंद होईल यासाठी प्रयत्न करावेत ही कळकळीची विनंती.

श्री गोविंद महाराज यांच्या समाधी मंदिरापासून हरिहरेश्वर मंदिराकडे जातांना डाव्या बाजूला एक सुंदर गणपती मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते. मराठा शैलीतील या मंदिराला कैची पाषणांचा वापर करून मजबुती दिली आहे. शिखरावर चुन्याचे अप्रतिम काम करून सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या कदाचित अष्टसिद्धी असाव्यात असे वाटते. चारही बाजूला ऑइल पेंट ची रंगरंगोटी केल्याने त्या मूर्तीतील सूक्ष्म तरल भाव ओळखता येत नाहीत परंतु मंदिर फारच रेखीव सुबक आहे.     पेशवेकालीन असलेल्या या मंदिराला आवर्जून भेट द्यावी असेच हे मंदिर आहे. मंदिरातील गणेश मूर्ती चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी, मुधाईदेवी, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळे येथील संगमेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीची विलक्षण साधर्म्य दर्शवते  त्यामुळे ही मूर्ती परिसरातील एखाद्या मंदिरातून येथे प्रतिष्ठापित केली असावी का असाही प्रश्न निर्माण होतो.

काही असो,  हा संपूर्ण परिसर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने एका दिवसाच्या सहलीसाठी फारच सुंदर आहे. येथून जवळच सह्याद्रीच्या अजिंठा पर्वत रांगेत मुर्डेश्वर आचे प्राचीन मंदिर आहे. पावसाळ्यात पर्यटनाची हौस असणाऱ्या गिरी प्रेमींनी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. पर्यावरणप्रेमी, निसर्ग वेडे पक्षीप्रेमी चातक, धार्मिक आस्थावान व इतिहास अभ्यासक या सर्वांना हे स्थान निश्चितच भरपूर आनंद देईल असे आहे. दिवाळीच्या सुट्टीत एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय योग्य असे हे स्थान आहे.

संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव

 https://www.discovermh.com/harihareshwar-temple-pimpalgaon/

 https://www.deshdoot.com/local-news/nasik/glory-of-malegaon-ancient-mahadev-temple

 मालेगांव शहरातील ( Malegaon City ) काही वास्तू-स्थळांना ऐतिहासिक व प्राचीन वारसा लाभलेला आहे. त्यात मालेगांव भागाचे राजे श्रीमंत सरदार नारोशंकर राजेबहादूर यांच्या कतृत्वाने निर्मित मालेगांवचा भुईकोट किल्ला व त्यालगत असलेले श्री महादेव मंदिर, श्री किल्ला हनुमान मंदिर, वावीकरांचे श्री निळकंठेश्वर मंदिर, सटवाजी बुवा यांचे श्री विठ्ठल मंदिर, श्री रामसेतू हनुमान मंदिर, शिंपी समाजाचे शनीमंदिर लगतच श्री सत्यनारायण मंदिर असा हा धार्मिकदृष्ट्या समृद्ध परिसर आहे.

साधारणपणे किल्ला बांधताना मोसमनदी पात्रात मधोमध श्री महादेव मंदिर ( Shri Mahadev Mandir- Malegaon )निर्माण केले गेले आहे. सदर मंदिर काळ्या पाषाणातून साकारलेले आहे. भक्कम दगडी पाया व चिरेबंदी, त्यावर तिन फूट रुंदीच्या दगडी भिंती असे हेमाडपंती शैलीतील विटा व चुण्यात बांधलेले सुबक कळसयुक्त मंदिर बघताच नजरेत भरते. भव्यता आणि दिव्यतेमुळे आपोआपच भाविक नतमस्तक होतात.

संपूर्ण पंचक्रोशीत या मंदिराला तोड नाही. मंदिराचे स्वरूप म्हणजे मुख्य गाभारा, ज्यात भव्य अशी शंकराची पिंड आहे. गाभार्‍यात दुर्गादेवीची सिंहारुढ मूर्ती नंतर बसविण्यात आली आहे. दुसरे नंदी सभागृह आहे. तेथे श्री गणेशाची शेंदुर चर्चीत भव्य पाच फूट उंचीची दगडी मूर्ती भाविकांना आशीर्वाद देत असते.

काळ्या पाषाणातील भव्य नंदीची मूर्ती साधारणपणे शिवलिंगासमोर सरळ रेषेत असलेली! ध्यानमग्न अवस्तेतील मुद्रा असलेली नंदीचा मुर्ती, नागांचे स्वतंत्र छोटेखानी दगडी मंदिर तसेच कासव व द्वारपालांच्या दगडी मूर्ती, मंदिराबाहेर महाबली हनुमानाची गदाधारी शेंदूर चर्चीत वीरमुद्रा असलेली मूर्ती व मंदिर.

मंदिराच्या भोवतालचा परिसर हा घडीव दगडी बांधकामाचा असून मोसमनदी किनारी दगडी घाट व पायर्‍या बांधलेल्या आहेत. मंदिराबाहेर तुळशी वृंदावन व एक भुयार आहे. राजपरिवारासंबंधीत काही समाधीसुद्धा आहेत. शहरीकरणाच्या विस्तारापूर्वी सदर घाटावर भाविक व जनता पिण्याचे पाणी भरण्यासह अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी येथेच येत असत.

मंदिर व्यवस्थापनासाठी गुरव परिवाराला पाचारण केलेले होते. त्यांना उदरनिर्वाहासाठी घरे व शेतजमीनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. येथे श्रावणी सोमवार, महाशिवरात्री, हरी-हरभेट इत्यादी उत्सवात भाविकांची मोठी मांदियाळी असे. सदर मंदिरात आतापर्यंत असंख्य रूद्रपूजा, अभिषेक, होमहवन व आरत्या होऊन शिवलींग अत्यंत पावन व जागृत झालेले आहे. येथे भाविकांची निस्सीम व अढळ श्रद्धा आहे. असे वैभवशाली परंपरा असलेले मंदिर व परिसर कालांतराने काही प्रासंगिक व नैसर्गिक कारणांमुळे दुर्लक्षित झाले. अनेक पूर तसेच 1979 चा महापूर सुद्धा मंदिराने सहन केला.

गेले पावणे तीनशे वर्ष ऊन, वारा, पावसाचे आघात झेलून मंदिर व परिसराची दुरावस्था झाली होती. मंदिराचे दगड सुद्धा तुटून चोरीला गेले होते. परिसराला अतिक्रमणांचा विळखा पडला होता. लोक परिसरात प्रात:विधी व गैरकृत्य करू लागल्यामुळे मंदिर बरीच वर्षे बंद राहू लागले. अधून-मधून उत्सवापुरते उघडले जात. मंदिराच्या वरच्या बाजूला शवविच्छेदनगृह होते. त्यामुळे भाविकांना परिसरात येण्याची भिती वाटे. काही वर्षांपूर्वी शहरातील व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंदिरात पुनश्च नित्य आरती, पूजापाठ सुरू केले. मंदिर व परिसराची देखभाल, पूजाअर्चा, उत्सव साजरे करून शहरातील भाविकांना मंदिराकडे आकृष्ट केले.

भाविकांनी एकत्र येऊन दैनंदिन पूजाअर्चा व उत्सव साजरे करण्यास हातभार लावत मंदिराची देखभाल, जीर्णोद्धार, उत्सव साजरे करणे व उदभवलेल्या समस्यांचे निस्तरीकरण आदी कार्य स्वखुषीने आपल्या खांद्यावर घेतले. नंतरच्या काळात पंकज रामेश्वर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांची श्री महादेव सेवा समिती स्थापन झाली. त्यावेळी अनिल मोरे, सुनील मोराणकर, संजय जगताप, अनिल परदेशी, वसंत श्रीवास्तव, भिका साखरे, कैलास सोनवणे, मिलींद गवांदे, रमेश मंडाळे, सचिन जाधव, संतोष जाधव, नारायण गवळी, रणजीत भाटी, खेमचंद तलरेजा, राकेश पगारे, प्रसन्न शिनकार, गजानन शिरसाठ आदी अनेक कार्यकर्त्यांचे तन, मन, धनाने सहकार्य लाभले. सोबतच समितीच्या स्थापनेपुर्वीच्या ज्येष्ठ सदस्यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत होते.

समितीने आत्तापर्यंत भाविकांच्या सहकार्याने मंदिराचा आतुन व बाहेरुन संपूर्ण जीर्णोद्धार केला असून मुळ रचनेला कुठलाही धक्का न लावता प्राचीन वास्तूकला जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.

महादेवाच्या पिंडीला सुद्धा वेळोवेळी डागडूजी करून आधी तांब्याचे कवच आणि सध्या पितळी कवच चढवण्यात आले आहे. बाहेरुन सुद्धा कळसाचे जीर्ण झालेले प्लास्टर काढून मुळ रचनेतच नवीन प्लॉस्टर व रंगरंगोटी झाली आहे. लोकप्रतिनिधी दीपक भोसले व अ‍ॅड. ज्योती भोसले, राजेश गंगावणे, ताराबाई शिरसाठ, चिंतामण पगारे, मच्छिंद्र अहिरे आदींनी नगरसेवक निधी देऊन परिसराला वॉल कंपाउंड व तार कंपाउंडने संरक्षित करण्यास सहकार्य केले. तरीही थोडे काम शिल्लक आहे. त्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन दिले असून नगरसेविका दीपाली विवेक वारुळे यांचे सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मंत्री दादा भुसे यांनी शोभिवंत लाईट, स्ट्रीटलाईट उभारून दिले. तसेच नगरसेविका वारुळे यांनी प्रयत्न करून सभोवताली पेव्हरब्लॉक व मंदिराच्या पाठीमागे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना पाठपुरावा करून काँक्रीटीकरण करून दिले आहे. इतर नगरसेवकानी इलेंट्रीक पोल, बाकडे इत्यादि देऊन सहकार्य केले आहे. माजी उपमहापौर नरेंद्र सोनवणे यांनी मंदिरासाठी बोअरवेल करून दिली आहे.

नदीविकास आराखड्यात संगमेश्वर ते महादेव मंदिर असा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. उत्सव व विविध उपक्रमांसाठी मुळ मंदिराची जागा अपुरी पडत असल्यामुळे मंदिराचा चहूबाजूंनी विस्तार करण्याचे समितीने काम हाती घेतले आहे. मंदिरच्या समोर जोडूनच एकसंघ सभामंडप व इतर बाजूंनी वाढवून विस्तारीत कार्य स्ट्रक्चरवर छतापर्यंतची उभारणी लोकसहभागातून केली आहे. ंकृषीमंत्री भुसे यांच्याकडून सुद्धा सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

राजेबहादूर परिवाराकडून वेळोवेळी सहकार्य प्राप्त होत असते. सध्या वर्षभरात श्रीमहाशिवरात्री उत्सव, श्रावण महिना, श्री हरिहर भेट उत्सव आदी साजरे केले जातात. तसेच नित्य आरती, अनुषंगिक धार्मिक परंपरा जतन केल्या जातात. समिती स्थापण्यासोबतच जयशंकर भजनी मंडळाची देखील स्थापना केली गेली आहे. भजनी मंडळाद्वारे दरसोमवारी रात्री दोन तास भजन केले जाते. प्रसंगानुरूप विविध आमंत्रणावरून अनेक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम केला जातो.

 

 https://www.discovermh.com/sangameshwar-temple-nagardevale/

संगमेश्वर मंदिर नगरदेवळे | Discover Maharashtra

Discover Maharashtra

संगमेश्वर मंदिर, नगरदेवळे

संगमेश्वर मंदिर नगरदेवळे…

नगरदेवळे गावाच्या वायव्येस तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे प्राचीन मंदिर ! तीन नद्यांच्या पवित्र संगमावर एका उंच टेकडीवर या मंदिराचे निर्माण कार्य झाल्याने त्याला संगमेश्वर महादेव म्हणतात.
संगमेश्वर मंदिर नगरदेवळे मंदिराचे नंदीगृह, सभामंडप व गर्भगृह असे तीन भाग पडतात. तीनचार वर्षांपासून या मंदिराचे जीर्णोद्धार कार्य भारतीय पुरातत्त्व खात्याने सुरू केले आहे. नंदीगृहाचे पुनर्निर्माण नव्याने केले आहे. त्यात प्राचीन नंदीची मूर्ती आहे . त्याची उंची तीन फूट लांबी चार फुटांपर्यंत आहे. गळ्यात घंट्यांची सुंदर साखळी माळ आहे . नंदिसमोर भद्र कलशधारी अलगद कोरलेला असून तो नंदिसमोर बसलेला आहे त्याचे तोंडमात्र शिवाकडे आहे अशा प्रकारचं नंदीशिल्प पाटणादेवी परिसरात पण आहे. येथे नंदीची शिंगे व कानांची मात्र झीज झाली आहे. मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला एक वराह नंदी आहे .याचा आकार वराहासारखा असतो . त्यांना यज्ञवराह असेही म्हणतात. मूर्तीशास्त्रानुसार त्याला भूवराह असेही म्हणतात .

आता आपण सभागृहात प्रवेश करतो . डाव्या हाताला भिंतीला उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती लक्ष वेधून घेते . मूर्तीची सोंड नंतर दुरुस्त केलेली असली तरी हात व पायांची ठेवण प्रमाणबद्ध आहे . प्रत्येक पायात दोन असे चारही पैंजणांचे कोरीव काम सुबक आहे .कंबरेचा नंदीपाश , यज्ञोपवीत , मूषक हातातील परशु , अंकुश, मोदक ठळकपणे दिसतात.वरदहस्त मात्र भग्न झाला आहे .

सभागृहात उजव्या हाताला देवडीत तीन मुर्ती आहेत. पैकी एक डाव्या सोंडेची गणेशाची आहे . उजवा व डावा असे दोन गणेश असा दुर्मिळ योग्य येथे पहावयास मिळतो . ( पद्मालय सोडल्यास )
गणपतीच्या बाजूला चंडिकेची अर्धमूर्ती पहावयास मिळते . ही सप्तमातृकांमधील एक देवी म्हणून ओळखली जाते .ही देवी चालुक्यवंशाची कुलदेवता आहे त्यामुळे हे मंदिर चालुक्य कालीन असावे का ? असाही प्रश्न निर्माण होतो .
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पोट खपाटलेले असून पोटावर विंचू कोरलेला आहे . तो भुकेचे प्रतीक आहे . तिला सहा हात असून ती शस्त्रधारी आहे .उजव्या हातात बालक मूर्ती कोरलेली दिसते . कंबरेला मेखला घंटाकर आहे .
चंडिकेच्या बाजूला पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे .या मूर्त्यांचे चेहरे अस्पष्ट असल्याने त्यांचे सौंदर्य दिसत नाही . त्याच्याच बाजूला शंकर पार्वतीचे शिल्प आहे .

सभा मंडपाला प्रत्येक कोपऱ्यात तीन असे बारा खांब आहेत . खांबावरील कोरीव काम वाखाणण्याजोगे आहे . सभा मंडपाचे काम गोलाकार असून हवा व उजेड येण्यासाठी मोकळे ठेवले असावे .
आता आपण गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो .गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार अत्यंत सुंदर असून अप्रतिम सुबक कोरीवकाम त्यावर आढळून येते . उंबरठ्याच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला किर्तीमुख कोरलेले आहे .विशेषतः शिवमंदिराच्या पायऱ्यांवर व इतर मुर्तींच्या मागे किंवा डोक्यावर किर्तीमुख कोरलेले असते . या ठिकाणी दोन शिंगे असलेली बटबटीत डोळ्यांची दोन किर्तीमुखे आहेत .त्यांचा चेहरा सिंहाचा आहे .

पद्मपुराणाच्या एका दंतकथेनुसार या किर्तीमुखाचा संबंध शिवाशी येतो . राहू आणि शिव यांच्या वादात शंकराच्या क्रोधाग्नीतून किर्तीमुख हा भयंकर प्राणी जन्माला आला . परंतु राहूने क्षमायाचना केल्यावर शंकराने किर्तीमुखास थांबविले .पण किर्तीमुखास भयंकर भूख लागली . तो मांसाची याचना करू लागला .तेव्हा शंकराच्या आदेशाने तो स्वतःचेच मांस खायला लागला . शेवटी त्याचे मुखच शिल्लक राहिले . या आज्ञाधारक पणाबद्दल शंकर त्याची प्रशंसा करतात व त्याला थांबवतात .तेव्हापासून किर्तीमुख हा शिवाच्या पायाशीच असतो .

किर्तीमुखाच्या डाव्या व उजव्या बाजूला शिल्पमालेत असंख्य देवी देवतांच्या शिल्पाकृती आहेत . तसेच मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूस अनेक देवतांच्या मूर्ती आहेत . त्यांचा स्वतंत्र अभ्यास करता येईल . मध्यभागी गणेशाची आकृती असून त्यामागे गणसेना असावी .

सभामंडप व गर्भगृहाचे खांब तसेच भव्य तुळया पाहिल्यावर थक्क व्हायला होते .साधारणतः 11 व्या शतकात या मंदिराचे बांधकाम पाहता कुठलेही तंत्रज्ञान विकसित नव्हते असे म्हणणे धाडसाचेच होईल .आपल्या पूर्वजांच्या तंत्रशुद्ध ज्ञानाबद्दल आपण विस्मित होतो .
मंदिराचा बाह्यभाग अत्यंत सुंदर व प्रशस्त आहे. मंदिर बांधकाम करतांना कुठेही चुन्याचा वापर करण्यात आला नाही . दगडी तुळया व खांब एकमेकांत साखळी पध्दतीने गुंफलेले आहेत . मंदिराची लांबी 50 फुटांपेक्षा अधिक आहे . चारही बाजूंनी मंदिर पाहतांना त्याची भव्यता जाणवते . एका नजरेत मंदिर पाहता येत नाही .

मंदिर परिसरात अनेक दुर्मिळ शिल्पे आढळतात .पैकी शिवपार्वती शिल्प अप्रतिम आहे . शिवाच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली आहे .तिच्या डोक्यावर नागाने फणा उभारला आहे . शिव हे नंदीवर पद्मासनात बसलेले आहेत . मूर्तीच्या डाव्या बाजूस गणपती आहे .शिवपार्वतीच्या मागे दोन दंडधारी उभे आहेत . ते वीरभद्र व कार्तिकेय असावेत असे वाटते .
शंकराची अजून एक मूर्ती नंदीवर विराजमान आहे. स्थानिक लोकांनी शेंदूर चढविल्यामुळे मूर्तींचे मूळ स्वरूप नष्ट झाले आहे. उघडयावर असल्याने या मूर्तींची झीज झाली आहे . पुरातत्व विभागाने मंदिर जीर्णोद्धारसोबत या शिल्पकृतींचे पण संवर्धन करावे ही अपेक्षा !!!

संजीव बावसकर, नगरदेवळे




 
 
बिजासन माता मंदिर.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर हे मंदिर वसलेले आहे.
नवरात्रात ९ दिवस येथे विविध उत्सव साजरे केले जातात.
तसेच यात्रा देखील भरली जाते.
माहितीनुसार कोरोना महामारीमुळे या वर्षीचा नवरात्र उत्सव भक्तांसाठी रद्द करण्यात आला असुन मात्र मंदिरावर आकर्षक रोशनाई करण्यात आली आहे.
धुळे शहारापासुन केवळ ८५ किलोमीटर वर हे मंदिर आहे.

 
 आशापुरी भवानी मंदिर,मुल्हेर : हे मुल्हेर नजिकचे भारतातील एक अति प्राचिन स्थान असुन निसर्गरम्य वातावरणात वसले आहे। येथे बाजुलाच धबधबा आहे.कौटोंबिक वनभोजन सहलीसाठी अतिशय उत्तम स्थान आहे. हि देवी प्रेमळ असुन भक्तांच्या हाकेला लगेच धावते. पुढेच जाखोड धरण आहे त्यामुऴे सुंदर वाटते..
 

 
बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील अतिशय निसर्गरम्य पर्वतरांगातील मुल्हेर किल्ल्याच्या मागील बाजूस पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र नरकोळ येथील आशापुरी माता मंदिर. संपूर्ण बागलाण तालुक्यातील भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असल्याने या मंदिर परिसराला भव्यता प्राप्त झाली आहे. श्री आशापुरी माता मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर भारतातील चार स्थानापैकी एक स्थान आहे. मंदिरासमोर श्री हनुमान, शेजारी शिवशंकर व मागील बाजूस श्री गणेशाचे मंदिर आहे. या मंदिरामधून मुल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी भुयारी मार्ग असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. येथून जवळच असलेल्या हरगडावर जाण्यासाठी पायवाट आहे. मंदिराच्या बाजूलाच चौरगड म्हणुन एक किल्ला आहे. मंदिराची काही बाजू पडझड झालेली आहे. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराशेजारून करंजाडी नदी वाहते. बारमाही वाहणाऱ्या या नदीमुळे हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य वाटते. मंदिर परिसर डोगंरांनी व दाट जंगलाने वेढलेला असल्याने भाविकांचे मन रमून जाते. काही वर्षांपूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी एक शिलालेख प्राप्त झाला असून, त्याद्वारे मंदिराची महती स्पष्ट होते. इ. स. १३०७ मध्ये मंदिराचे काम झाल्याची माहिती शिलालेखात आहे. या शिलालेखाचे वाचन मुल्हेर येथील श्री उद्धव महाराज समाधी संस्थानचे प्रमुख वै. ह. भ. प. डॉ. रघुराज महाराज पंडीत यांनी करून मंदिराच्या संपूर्ण इतिहासाचा उलगडा केला. यानंतर या मंदिराची महती व भव्यदिव्यत्वाता तसेच प्रचिती भक्तगणांना येवू लागल्या नंतर दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमााणात भाविक हजेरी लावू लागले आहेत.
नवसाला पावणारी देवी म्हणून श्री आशापुरी मातेची ख्याती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील आदिवासी बांधव देवीची मनोभावे सेवा करित आहेत. श्रiी हनुमान जयंतीनिमित्त मंदिर ठिकाणी भव्य यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. या निमित्त राज्यभरातून भाविक येथे दाखल होत असतात. सटाणा येथून करंजाड मार्गे जाण्यासाठी एस. टी. आगारातून विशेष एस.टी. बसेसची सोय करण्यात आली आहे. कसे पोहोचणार :सटाणा➡️करंजाड➡️पिंगळवाडे➡️नरकोळ.
सटाणा शहरापासून अंतर :30 km.
 


 
 
कालिमाथ
औरंगाबाद
तालुका कन्नड.
कालिमाथ केवळ अशीच जागा आहे जिथे कालीची तिच्या बहिणी लक्ष्मी आणि सरस्वतीसोबत पूजा केली जाते. देवी कालीचे मंदिर आहे, जे मोठ्या संख्येने भाविक वर्षभर भेट देतात, विशेषत: नवरात्रोवेळी..
 

 
परंपरा [[ खान्देशातील सण आखाजी ]]
नुकत्याच येणाय्रा अक्षयतृतीयेला खान्देशात दिवाळीइतकंच महत्त्व असतं. माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. पुरुषमंडळींना या दिवशी चक्क जुगार खेळण्याची परवानगी असते.
जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्य़ांच्या भूप्रदेशाला ‘खान्देश’ म्हणून आेळखले जाते. स्त्री वर्गाला माहेरची आेढ लावणारे अनेक सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. त्यात विदर्भातील आखाडी, तर मराठवाडय़ातील नागपंचमी आणि खान्देशातील आखाजी या सणांचा समावेश करता येईल. खान्देशाची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय़ जपून आहेत.
वैशाख शुद्ध तृतीयेला देशावर अक्षयतृतीया म्हटले जाते, त्यालाच खान्देशात आखाजी असे म्हणतात. याच दिवशी कृतयुगाचा प्रारंभ होतो, असे मानले जाते. या प्रारंभ दिवसाला पवित्र मानून धर्मकृत्ये पार पाडण्याची प्रथा आहे. या दिवशी केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, देवांच्या आणि पितरांच्या नावाने केलेले कोणतेही कर्म अक्षय किंवा अविनाशी होते, असे मानतात. याच दिवशी परशुरामाचा जन्म झाला म्हणून प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून अघ्र्य देतात. स्त्रिया चैत्रात बसविलेल्या चैत्रागौरीचे याच दिवशी विसर्जन करतात.
खान्देशात आखाजी हा सण दीपावलीइतकाच महत्त्वाचा गणला जातो. शाळा आणि महाविद्यालयांना असलेली उन्हाळ्याची सुटी ही ‘आखाजी’ची सुटी म्हणूनच आेळखली जाते. अर्थात या सुटय़ा कधीकधी या सणानंतर लागतात. खान्देशवासीयांचे हे दुर्दैवच की, या सणाला इतर सणांप्रमाणे सुटी जाहीर केलेली नाही.
आखाजी-स्वातंत्र्याचा दिवस
खान्देशातील आखाजी हा सण सर्वासाठी संपूर्ण बंधनमुक्तीचा दिवस असतो. या दिवशी स्त्री, पुरुष, शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध या सर्वाना पूर्ण स्वातंत्र्य लाभते. प्रत्येक जण बंधनमुक्त असतो. काम करणाऱ्या मजुरांना या दिवशी सुटी असते. शेतकरी सर्व शेतीची कामे या दिवशी बंद ठेवतात. मुलांना, तरुणांना पैसे, पत्ते, जुगार खेळायला पूर्ण मुभा असते. प्रत्येक विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असते. आबालवृद्धांना आमरस आणि पुरणाची पोळी यासह सांजरी आणि घुण्या अशा मिष्ठान्नांची सुस्ती येते. ‘आगारी’ या प्रथेतून या दिवशी पूर्वजांचीही सोय केलेली आढळते. अशा प्रकारे खान्देशातील प्रत्येक व्यक्ती या सणाला मुक्त असते. दूरवर नोकरी करणारा प्रत्येक जण या दिवशी सुटी घेऊन बायकोमुलांसह आपल्या गावी परतलेला असतो.
शेतकरी-शेतमजुरांची आखाजी
अक्षयतृतीयेच्या दिवशी शेतकरी शेतीची कामे बंद ठेवतो. शेतमजुरांना या दिवशी सुटी असते. वर्षांच्या कराराने काम करणाऱ्या सालदाराचा हिशेब या दिवशी पूर्ण करून त्यास शेतकरी बंधनमुक्त करतो. सालदाराचा हा दिवस जुन्या मालकाकडील वर्षांचा शेवटचा दिवस असतो. याच दिवशी वाढीव रकमेवर शेतमजूर त्याच शेतकऱ्याकडे किंवा दुसऱ्या श्ेातकऱ्याकडे सालदार म्हणून करारबद्ध होत असतो. शेतकरी व शेतमजूर प्रेमळ, विश्वासू अशा व्यक्तीची निवड करून प्रसंगी जास्तीची रक्कम देऊन करारबद्ध होतात. याच काळात मुलामुलीच्या लग्नासाठी शेतमजूर शेतकऱ्यांकडून आपल्या मजुरीची आगाऊ रक्कमही घेत असतो. या सालदाराची एका वर्षांची मजुरी गावागावांनुसार व शेतकऱ्याच्या कामाच्या व्यापानुसार भिन्न असून साधारणत: आठ ते पंधरा हजार रुपये आणि काही पोते धान्य अशी आढळते. या दिवशी जुन्या सालदाराला मालकातर्फे जेवण दिले जाते. त्यास नवे जोडे कपडे शिवून दिले जातात. जुगार खेळायला व दारू प्यायला अतिरिक्त पैसेही दिले जातात. जुना सालदार आपल्या ताब्यातील कृषी अवजारे मालकातर्फे नव्या सालदाराकडे सुपूर्द करतो. अशा प्रकारे शेतमजुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आखाजी हा सण. त्याच दिवशी हवा तो मालक निवडण्याचे आणि जुन्या मालकापासून रजा घेण्याचे स्वातंत्र्य या शेतमजुरास लाभते.
जुगार खेळण्याचा दिवस
आखाजी हा सण जुगार खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी सर्व मुले, माणसे पत्ते खेळतात. वर्षभर पत्त्यांना स्पर्श न करणारी मंडळी या दिवशी हमखास पत्ते खेळतात. त्या खेळात पैसे हरणे किंवा जिंकणे हे आलेच. जुगाराला बंदी असली तरी आखाजीच्या या काळात सर्वाना मुक्तपणे जुगार खेळता येतो. गल्लीत, आेसरीवर, गोठय़ात, झाडांखाली, देवळांच्या आेटय़ावर, पारावर अशा सर्वच ठिकाणी पुरुष मंडळी गटागटांनी पत्ते खेळताना आढळतात. कमी पैशांचे, जास्त पैशाचे असे ‘डाव असतात. जो तो आपल्या ऐपतीनुसार हव्या त्या डावात बसतो. आईवडील आपल्या मुलांना पत्ते खेळण्यासाठी पत्ते आणून देतात. खेळायला पैसेही देतात. असे पत्त्यांचे डाव आठ दिवस आधीच दिसायला लागतात. मात्र कायदे व पोलीस यांचा जबर धाक यामुळे हे प्रमाण शहरी भागात कमी होत चालले आहे. मात्र अक्षयतृतीयेला पोलीस खात्यालासुद्धा अशा जुगाराकडे कानाडोळा करावा लागतो. पूर्वी मुले या जुगारात कवडय़ाच खेळत असत. या दिवशी शेतमजुरांनासुद्धा जुगार खेळण्यासाठी मालकाकडून खुशाली म्हणून पैसे दिले जातात. जुगार खेळण्याच्या अतृप्त इच्छेला आखाजी या सणामुळे वाट करून दिली जाते. विशेष बाब ही की, मुलांना पैसे व पत्ते देणारे पालक अक्षयतृतीयेच्या दिवसाव्यतिरिक्त वर्षभर पत्ते, पैसे न खेळण्याचे आणि खेळू न देण्याचे नैतिक बंधन पाळतात.
आखाजी स्त्रीमुक्तीची :
जसजसे उन्हाळ्याचे तापमान तापू लागते तसतशी नवविवाहितेची हुरहुर वाढू लागते. अक्षयतृतीयेसाठी माहेराहून मूळ येण्याची ती वाट पाहते. आखाजीला माहेरी जाऊन झोक्यावर बसून सासरची सुखदु:खे गीतातून गायला ती आतुर झालेली असते. प्रत्येक विवाहित स्त्री आखाजी या सणासाठी माहेरी जाते. आखाजी हा स्त्रियांसाठी पूर्ण स्वातंत्र्याचा दिवस. हसणे, खिदळणे, झोके घेणे, गाणी गाणे, मारामारी करणे या सर्व अतृप्त इच्छांच्या पूर्तीचा हा दिवस. त्यासाठी सासरी राहून कसे चालेल? सासरी सासू-सासरे, दीर, नणंदा यांच्यासमोर स्वातंत्र्य मिळणे शक्यही नसते. आखाजीचे तीन दिवस स्त्री आपल्या माहेरी जाणं या स्वातंत्र्याचा मनसोक्त आनंद लुटत असते. द्वितीयेला गावभरच्या बायका, मुली एकत्र येतात. डफ वाजवीत बायकांची मिरवणूक शिवमूर्ती आणायला कुंभाराच्या घरी जाते. आधीच घराघरांत स्थापन केलेल्या गवराई ऊर्फ गौरीच्या प्रतिमेजवळ ती प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रभर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासारखे स्वरूप या ‘गौराई उत्सवाचे खान्देशात आढळते. सर्व मुली, स्त्रिया एकत्रित येतात. गौराईच्या पाणी आणण्याच्या निमित्ताने त्या गावाशेजारच्या आमराईत जमा होऊन झिम्मा, फुगडी, नृत्य करतात, गाणी गातात. गावातून जाताना त्या पुरुष वेशात सजविलेल्या मुलीला वाजतगाजत नेतात. त्यास मोगल असे म्हणतात. मोगल ही मुलगी पॅन्ट, शर्ट, हॅट, डोळ्यांवर गॉगल, हातात उघडे पुस्तक अशा पोशाखात जमावातून वाजतगाजत चालत राहते. तिच्या डोक्यावर छत्री धरलेली असते. गावातून जात असताना बायका, मुली गाणी म्हणतात. गावाबाहेर आमराईत नाच, गाणे, झिम्मा-फुगडी झाल्यावर घराकडे परतात. या काळात पुरुष मंडळी जुगार खेळण्यात गर्क झालेली असतात. अक्षयतृतीयेला खान्देशभर प्रत्येक आेसरीवर किंवा झाडांवर झोका बांधलेला आढळतो. मुली-बायका रात्री बराच वेळपर्यंत झोका खेळतात, त्या वेळी गाणी, कथागीते गायिली जातात. या कथागीतांतून सासरचे सुखदु:ख, व्यवहारांतील अनुभव, उपदेश, चित्तथरारक कथा इ. विषय हाताळलेले असतात. झोक्यावर बसलेल्या मुलीच्या गाण्यांना झोक्यामुळे विशिष्ट सुरावट येते. तिच्यापाठोपाठ इतर मैत्रिणी त्या गाण्याला साथ देतात. या गाण्यांना आखाजीची गाणी म्हणून आेळखतात. गौराई आखाजीचा दुसरा दिवस हा स्त्रियांसाठी गौरी विसर्जनाचा असतो. घराघरांतील मुली, बायका पाटावर गौराईची प्रतिमा घेऊन बाहेर पडतात. ही मिरवणूक वाजतगाजत गावाबाहेर जाते. गावाबाहेर जात असताना सतत सामुदायिकरीत्या गौराईची गाणी गायली जातात. गावाच्या नदीकाठी मुली जमतात. तेथे झिम्मा, फुगडी खेळतात, नाचतात, गाणी म्हणतात.
नदीच्या दुसऱ्या काठावर पलीकडच्या गावच्या मुली हाच कार्यक्रम पार पाडीत असतात. गौरी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर दोन काठांवरील, दोन गावांच्या स्त्रिया परस्परांना शिव्या देतात, परस्परांवर दगडफेक करतात, गोटे मारतात. स्त्रियांच्या दोन गटांतील हे युद्ध बराच काळ चालते. अंधार पडण्यापूर्वी त्या आपापल्या घराकडे परततात. अलीकडे दगडांनी परस्परांना मारणे ही प्रथा बऱ्याच गावांतून कमी झाली आहे. थोडक्यात आखाजी हा सण स्त्रियांच्या गाणी गाणे, नृत्य करणे, पुरुषी पोशाख घालणे, शिव्या देणे, मारामारी करणे, झोके घेणे इ. अतृप्त इच्छांना वाट मोकळी करून देणारा असून एक बंधनमुक्त जीवन जगण्याचा दिवस आहे.
आखाजी पितरांची
आखाजी स्त्री-पुरुष, आबालवृद्धांचा जसा मौजमजा करण्याचा दिवस आहे तसाच तो आपल्या पूर्वजांना, पितरांना श्राद्धविधी करून स्मरण्याचा दिवस आहे. श्राद्ध पूजन हे खान्देशात दोन प्रकारचे आढळते, ज्यांचे आई किंवा वडील वारले ते पहिल्या वर्षी जे श्राद्ध घालतात त्यास ‘डेरगं पूजन’ असे म्हणतात, तर ज्याच्या आप्ताच्या मृत्यूला एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे ते ‘घागर पूजन’ या नावाचे श्राद्धविधी पार पाडतात. डेरगं आणि घागर ही दोनही सारख्याच आकाराची भाजलेली मातीची भांडी. डेरगं या मडक्याला तेलरंग दिलेला असतो. अशी डेरगी, लोणचे घालण्यासाठी खान्देशात सर्रास वापरली जातात. या श्राद्ध पूजनात त्या मातीच्या मडक्यात पाणी भरू न त्यावर पाण्याने भरलेला मातीचा लोटा ठेवतात. या नव्या मडक्याच्या कडांवर सुताचे पाच पाच वेढे गुंडाळतात, त्यात पूर्वीच उगवून ठेवलेल्या गव्हाच्या हिरव्या-पिवळ्या रोपांचे पाच पाच जुडगे उभे ठेवतात व वरून दोरा गुंडाळतात. हे मडके मातीच्या चार ढेकळांवर ठेवतात. त्या मडक्यांवर सांजोरी व नैवेद्य ठेवून पूजा करतात. अग्नीत नैवेद्याचे हवन करतात. त्यास आगारी टाकणं असे म्हणतात. त्यानंतर पंगतीत जेवायला बसलेल्या मुद्दाम निमंत्रित केलेल्या जातीतल्या, पण दुसऱ्या कुळातल्या विवाहित असलेल्या पुरुषाची पूजा करतात. त्यास ‘पितर’ म्हणून संबोधतात. लहान मुले, वृद्ध यांनादेखील अशा पूजेपूर्वी अन्न उष्टे करू दिले जात नाही. अशा प्रकारे या सणानिमित्ताने प्रत्येकाच्या मनात पितरांची स्मृती जागृत होते.
आखाजी बलुतेदारांची
खान्देशातील आखाजी हा सण शेतकरी, शेतमजूर,पुरुष आणि स्त्रिया यांचा जसा आहे तसा तो शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बलुतेदारांचाही आहे. या सर्व बलुतेदारांना ‘सांजऱ्या’, ‘घुण्या’ हे पदार्थ दिले जातात. वर्षभराच्या कामाची जी ठरलेली रक्कम किंवा धान्याचा हिस्सा असेल तो त्या बलुतेदाराला आखाजी या दिवशीच मिळत असते. बलुतेदाराच्या या हिश्शाला किंवा रकमेला ‘गव्हाई’ असे म्हणतात. बलुतं या शब्दाला खान्देशात पर्यायी शब्द गव्हाई असा रूढ आहे. बलुतेदार हे आपल्या सेवा श्ेातकऱ्याला वर्षभर प्रदान करतात. त्या मोबदल्यात त्याच्याकडून रोख रक्कम आणि धान्य अक्षयतृतीयेला घेतात. अशा प्रकारे आखाजी हा शेतमजुरांचा आणि बलुतेदारांचा नव्या वर्षांच्या आरंभीचा दिवस आहे.
तयारी आखाजीची
उन्हाळ्याच्या सुरुवातीला खान्देशात घरोघरच्या स्त्रिया वडे, पापड, कुरडय़ा, शेवया करतात. त्यानंतर त्यांना अक्षयतृतीयेचे वेध लागतात. अक्षयतृतीयेसाठी घर सारवून, झाडून स्वच्छ करतात. घरातील प्रत्येक चीजवस्तू साफ केली जाते. पत्र्याचे डबे, भांडी नदीवर नेऊन घासून आणतात. घरातील चादरी, गोधडय़ा, वाकळी स्वच्छ धुऊन काढतात. दीपावलीप्रमाणेच आखाजीसाठी घराची साफसफाई केली जाते. ही तयारी आखाजीपूर्वी पंधरा-वीस दिवस आधीच सुरू होते. घराघरांत ‘सांजोऱ्या’ आणि ‘घुण्या’ हे पदार्थ बनविले जातात. सांजोऱ्या या साखर किंवा गूळ घालून बनवितात. उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी अगर उन्हातून प्रवास करून आल्यावर शर्करायुक्त सांजोरी शरीराला ‘साखर’ देते. उन्हाची बाधा त्यामुळे टळते. आखाजीला आप्तेष्टांना, मित्रांना फराळाला बोलावतात. फराळ म्हणून सांजोऱ्या व घुण्याच असतात. खानदेशात दीपावलीला फराळाला बोलविण्याची पद्धती नाही, पण अक्षयतृतीयेला फराळाला बोलाविण्याची पद्धती आजही सुरू आहे.
जसजशी आखाजी जवळ येते, तसतसे शेतकरी योग्य असा सालदार हेरण्याचा प्रयत्न करतो. योग्य व्यक्तींना आमिष देतो. सालदारसुद्धा कंटाळलेल्या मालकाला सोडण्यासाठी इतर शेतमजूर मित्रांसह नवा मालक हेरण्याच्या प्रयत्नात असतो. मुलांची लग्ने जुळवून पैसे देणाऱ्या मालकाकडे सालदारकी पत्करतो, बलुतेदारसुद्धा महागाईनुसार त्या त्या घरातील कामाच्या व्यापानुसार आपल्या बलुतेदारीचे नवे दर जाहीर करतो. अशा प्रकारे प्रत्येक जण आखाजी या सणाची मोठय़ा आतुरतेने वाट पाहत असतो. खान्देशातील आखाजी हा सण आपली परंपरा आजही कायम टिकवून आहे. हा सण कामानिमित्ताने दूर दूर गेलेल्या खान्देशवासीयांना एकत्र आणणारा, स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करणारा, श्ेातकरी शेतमजूर आणि बलुतेदार यांचे ऋ ण फेडणारा, अनेक अतृप्त इच्छांना वाट करू न देणारा आहे. या सणातील बारीकसारीक विधींचा, गाण्यांचा, कथागीतांचा, नृत्य-परंपरा आदींचा अभ्यास करणाऱ्यांसाठी, लोकसाहित्याच्या अभ्यासकांसाठी ही पर्वणीच असते.
आखाजीचे आजचे बदललेले स्वरूप:- आखाजी आमच्या पिढीत जशी होती तशी आज राहिलेली नाही. तिचे स्वरूप पार बदलून गेले आहे. यांत्रिक जीवन, नोकरीधंद्यामुळे गाव सोडावा लागणे, कुटुंबांचे विभाजन, बदललेले कायदे, बदललेली गावांची रचना, पर्यावरणाचा ऱ्हास इत्यादी कारणांमुळे आखाजीचे स्वरूप बदलून गेलेले दिसते.
आखाजी पूर्वीप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्याचा दिवस राहिलेली नाही. आखाजीच्या दिवशीही शेतीची कामे आज होऊ लागली आहेत. हल्ली सालदार पद्धतीत मजूर अडकून राहायला तयार नाहीत. पूर्वी वर्षभराचे काही पोते धान्य व पाच ते सात हजार रुपये द्यावे लागायचे. हल्ली मजूर शासकीय दराने रोजचा हिशेब करून तीनशे पासष्ट दिवसांच्या मजुरीचा विचार करू लागला आहे. अन्नधान्याची पोती तो आता नाकारतो. शेतकऱ्याकडून धान्य घेण्यापेक्षा त्याला स्वस्त धान्य दुकानावर, धान्य सुरक्षाअंतर्गत २ ते ४ रुपये किलो या दराने मिळत असल्याने तो आता धान्यासाठी काम करीतच नाही. त्यामुळे सालदारकी ही पद्धती बाद होत चालली आहे. जे सालदार असतील त्यांच्या सालदारकीच्या कामाचे स्वरूपही आता पार बदलून गेले आहे. पूर्वी तो रात्रंदिवस मालकाकडेच सतत कामासाठी हजर राहात असे. आता तो केवळ दिवसांचे काही तासच बांधीलकी बाळगतो. पूर्वी मुलामुलीच्या लग्नानिमित्ताने वा अडचणीच्या वेळी शेतकरी आगाऊ रक्कम उचल म्हणून देत असे, त्यामुळे सालदार हा बांधला जात होता. आता तो बचत गटांकडून किंवा बँकेकडून उचल घेऊ लागला आहे. शासनाच्या नवनव्या योजनाही त्याला आíथक मदतीचा हात देतात. त्यामुळे कृषिजीवनाशी बांधीलकी असणारे या शेतमजुराचे संबंध बदलून गेले आहेत. बलुतेदारांची बलुतेदारीही आता संपुष्टात आली. तेही आता कामाचे रोख पसे घेऊन मोकळे होतात. शिवाय बलुतेदारांची कामेही आता बदलली आहेत, त्यांच्या सेवेचे प्रकारही बदललेले आहेत. सुतार आता अवजारे यंत्राने दुरुस्त करतो, तर केशकर्तनकार दर्जेदार सलून चालवितो, तो कुणाच्याही दाराशी जाऊन कटिंग करीत नाही. हे सगळं चित्र पालटल्याने आखाजीचे स्वरूपही बदलून गेले आहे.
तीच बाब आखाजीच्या झोक्यांची. गावाचे स्वरूप पार बदलून गेले आहे. गावात गटारी, रस्ते व नवनवे घरांचे बांधकाम यातून दारासमोर असलेली मोठमोठी निंबाची झाडे कापली, तोडली गेलीत. गावालगतीची आमराई ही आता अदृश्य झाली आहे. कुठे तरी चौकात एखादे झाड आढळते. त्याला सामुदायिक एखादा झोका बांधण्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्याच्या दाराशी मुली, बायका अल्लडपणे हसतखिदळत झोका खेळतीलही, मात्र हल्ली मोबाइलवर शूटिंग करणाऱ्या मुलांचेही वर्चस्व वाढत चालल्याने तेही स्वातंत्र्य बाद झालेले दिसते.
जुगार, पत्ते खेळणे हे कायद्याने जबर गुन्हा ठरत आहे. शिवाय दक्ष पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी जागृत राहून धाडीही घालताना आढळतात. त्यामुळे खुलेआम, झाडाखाली, ओटय़ावर पत्ते खेळणाऱ्यांची संख्या नाममात्र उरली आहे. मुले, मुली इतरत्र शहरांत शिक्षणानिमित्ताने दूर गेल्याने त्यांना आपल्या खेडय़ात येता येत नाही. खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही अक्षयतृतीयेला सुटी नाही, उलट त्या काळात मुलांच्या परीक्षाही असतात. त्यामुळे घराघरांतून मुलांची संख्याही रोडावत चालली आहे. घरात मुलंच नाहीत, कुटुंबात सदस्य संख्याच कमी झाली, सगळे विभक्त झालेत. शिवाय नव्या गृहिणींना पुरणाचे मांडे खापरावर भाजता येतीलच असे नाही. त्यामुळे मांडय़ांची जागा आता तव्यावरच्या लहान पुरणपोळ्य़ांनी घेतलेली आढळते. स्वयंपाकातील पदार्थाची संख्याही कमीकमी होत गेली. हल्ली तर आखाजीच्या निमित्ताने बनविल्या जाणाऱ्या घुण्या आणि सांजोऱ्या हा खाद्यपदार्थाचा प्रकार काही घरांतूनच पाहायला मिळतो. श्राद्धाच्या मडक्यावर ठेवण्यासाठी सांजोरी तरी बनविली जाते, मात्र घुण्या आता पाहायलाच मिळत नाहीत. त्यामुळे आखाजीची खाद्यसंस्कृतीही लोप पावत चालली आहे.
खेडय़ांतील नोकरीनिमित्ताने इतरत्र पांगलेले आता घराकडे येऊ शकत नाहीत. आहेत तेथेच डेरगं, मडकं घागर पुजतात. हल्ली मातीचे माठही महाग झाल्याने काही गृहिणी घरातील तांब्याच्या कळशीत पाणी भरून पुजताना दिसतात. शिवाय आगारी टाकायला शेणाच्या गोवऱ्याही दुर्मीळ झाल्याने गॅसवर तवा तापवून त्यावरच अन्न जळेपर्यंत तापवितानाही दिसतात.
आखाजीच्या तयारीची काळजी आता काहीशी कमीच झालेली दिसते. उन्हाळ्य़ात कराव्या लागणाऱ्या पापड, कुरडया, सांजोऱ्या आता बाजारातून रेडीमेड आणण्याकडे कल वाढत चालला आहे. घराघरांतून पत्र्यांचे डबे गायब झाल्याने त्यांची जागा स्टीलच्या, प्लॅस्टिकच्या डब्यांनी घेतल्याने आता आखाजीनिमित्ताने डबे घासण्याचा कार्यक्रमच बाद झालेला दिसता. गावागावांतून नद्याही गायब झाल्यात. नद्यांना पाणीच नाही. त्यामुळे सामुदायिकरीत्या नदीवर जाऊन भांडी घासणे, अंथरूण-पांघरूण स्वच्छ धुणे हेही बंद झाले. घराघरांत वॉिशग मशिनमुळे हा धुण्याचा कार्यक्रम रोजचाच बनला आहे. त्यासाठी आखाजीच्या मुहूर्ताची वाट कुणीही पाहात नाही. नदीवर गौराईचे विसर्जन, त्यातून गोटे मारणे, हेही बंद झालेले दिसते. शिक्षणामुळे आणि कायद्यांच्या बंधनामुळे मारामारी, शिव्या देणे हे तर मर्यादित झालेच, शिवाय गौराईऐवजी आता गणपती उत्सव, त्यातील विविध करमणूकप्रधान कार्यक्रम, शारदा उत्सव, टिपऱ्यांचा खेळ, गरबा नृत्य या बाबांचे प्रस्थ गावागावांतून वाढत चाललेले दिसते. झोके गेले, झोक्यावरची गाणी गेली, जाते गेले अन् जात्यावरची गाणी गेली. गौराई चालली, तिची गाणीही चालली. मोबाइल, टीव्ही हीच आता करमणुकीची साधने बनलीत. हल्ली गौराईची गाणी काहींनाच येतात.
शिक्षण, यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, संगणक, दूरदर्शन, मोबाइल यांनी जीवन पार बदलून टाकले आहे. काळाच्या ओघात या आखाजीचे स्वरूपही बदलून गेले आहे
 



 
 
कपार भवानी, बागलाण.
बागलाण मधील जवळपास सर्वच प्राचीन मंदिरे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहेत. त्यातील एक म्हणजे कपार भवानी. आपल्यातील बहुतेकांना प्रश्न पडला असेल, आता हे कुठे आलं? सटाण्यातील फार कमी लोकांना या ठिकाणाची माहिती आहे.
कपार भवानी हे गूढ निसर्गरम्य ठिकाण. उत्तर महाराष्ट्रात सह्य़ाद्री डोंगररांगेच्या सुरुवातीस असलेले बागलाणच्या ढोलबारी डोंगररांगेत हे ठिकाण आहे. मुल्हेर किल्ल्यापासून फक्त दोन किमी अंतरावर. मुल्हेर गावापासून साल्हेरकडे जाताना जामोटी हे गाव लागते. या गावात हरगड किल्ल्याची एक सोंड उतरली आहे. जामोटी हे गाव तसे पाहायला गेले तर संपूर्ण डोंगररांगेने आणि पाण्याच्या पाट-कालव्यांनी वेढलेले, गावात मोजक्याच तीस-चाळीस झोपडय़ा असतील; पण देवीच्या मंदिर पायथ्यापर्यंत गावकऱ्यांनी मार्ग बनवलेला आहे. पायथ्यापासून साधारण ३०० फूट उंचीवर हरगडावर ही देवी एका ६५ फूट निसर्गनिर्मित आणि किंचितश्या मानवनिर्मित कपारीत स्थित आहे. म्हणूनच तिला कपार भवानी म्हणतात. लेणी असावी अशी या ठिकाणी रचना जाणवते.
कपारभवानीपर्यंत जाताना एका ठिकाणी विसावण्याचा मोह आपल्याला होतोच, पण आपण दमलो म्हणून नाही तर समोर दिसणाऱ्या सेलबारी दुर्गशृंखलेमुळे. अथांग पसरलेले हरणबारी धरण, बाजूला मांगीतुंगी, तांबोळ्या सुळका, न्हावीगड, शेंदोडगड ही शिखरे आपल्याला बोलवत असतात. जणू हात लांबवून आमंत्रण देत असतात. त्यात डावीकडचा हरगड किल्ला आपल्याला त्याचे राकट स्वरूप दाखवत असतो व उजवीकडील जिभ्या सुळक्याचा तीक्ष्णपणा आपल्याला आणखी चेव आणत असतो. खरं तर हरगडावरच हे मंदिर आहे. सह्य़ाद्रीच्या रौद्र दर्शनानंतर पुन्हा चढाई करून माथ्यावर पोहोचलो की, तेथील सुंदर धबधब्याने नव्याने तजेला मिळतो. निव्वळ निखळ शांतता, एका लयीत येणारा खळखळ असा मंद आवाज आणि मधूनच एखाददुसऱ्या मोरांचे ओरडणे. धबधब्याचे तुषार अंगावर पडू लागताच कपारीसमोर पोहोचतो. काळ्याकुट्ट अंधारात देवीजवळचा दिवा शांतपणे लुकलुकत असतो. त्याचा वेध घेत गुहेत जायचे. मग दिसते ती अनोखी शिल्पकला. डोंगरात कोरलेली अष्टभुजा व अष्टफुटी भवानी मातेची मूर्ती. तिच्या हातातील शस्त्रे आणि चेहऱ्यावरील तेज पाहून सर्व थकवा निघून जाातो. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठीचे उग्र रूपपण जाणवू लागते. मूर्ती अभ्यासकांच्यामते मूळ मूर्ती महिषासूरमर्दीनीची असावी. तिच्या पायाशी रेडय़ाचे डोके असल्यासारखे दिसते. मूर्तीची ठेवण पाहता मूर्ती फार जुनी असावी असे वाटत नाही. पण मूर्ती रिलिफमध्ये कोरलेली दिसते. पूर्णपणे सुटी अशी कोरलेली नाही.कपार भवानी बागलाण,
वरच्या कडय़ावरून कोसळणारा बारमाही धबधबा, समोरील डोंगरावरील गुहा पुन्हा एकदा आपले लक्ष वेधतात. त्यामुळे कॅमेरा हातात घेतल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. खूपच अद्भुत आणि अध्यात्मिक असे निसर्गरम्य पवित्र तीर्थक्षेत्र आहे. शेकडो मोर आणि १२ माही धबधबे केव्हाही स्वागतास तयार असतात. त्यामुळे हरपून जायला होते. म्हणून आयुष्यात एकदा तरी नक्की बघावे असे हे ठिकाण आहे.
अतिशय निसर्गसुंदर असे हे स्थळ आहे. ही देवी पायथ्याशी असलेल्या जामोटी आणि मुल्हेर गावातील शेकडो लोकांची कुळस्वामिनी आहे. परंतु शासकीय स्तरावरून होत असलेले दुर्लक्षामुळे एक चांगले पर्यटन स्थळ जंगलात झाकले गेले आहे.
कसे पोहोचणारः
नाशिक ➡️सटाणा ➡️ताहाराबाद ➡️मुल्हेर ➡️जामोटी ➡️कपार भवानी मंदिर.
 
 
 आपल्या बागलाण प्रांताला महाभारत कालीन इतिहास लाभलेला आहे. पाच पांडवांचे या प्रदेशात एके काळी वास्तव्य होते. याच काळात अज्ञात वासात असतांना पांडवांपैकी एक नकुल, कडून या परिसरात एका शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. आज हे ठिकाण कपालेश्वर मंदिर म्हणुन ओळखले जाते. येथे सुमारे ८०० वर्षांपूर्वीचे महादेवाचे भव्य मंदिर आहे. कपालेश्वर मंदिर हे किकवारी बु. गावाजवळ आहे. मंदिर अत्यंत सुंदर तसेच शांत आहे. मंदिर आवारातच भलामोठा पिंपळाचा वृक्ष आहे. इथे मंदिरात बसल्यावर अत्यंत शांत तसेच थंड वातावरण अनुभवायास मिळते. मंदिराच्या उजव्या बाजूस खाली ओढ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या असून त्यांच्या सुरुवातीलाच लागून मोठी झाडे आहेत. पायऱ्या उतरल्यावर आपणांस पाण्याचा ओढा लागतो याचे उगम स्थान रस्ता परिसरातच छोट्या धबधब्याच्या रुपात आपणांस पहायला मिळते. कसे पोहोचणार : सटाणा - मुंजवाड - चौंधाणे - जोरण - कपालेश्वर.
सटाणा शहरापासून अंतर - 16 कि.मी
 
 
 
बीबी का मकबरा.. औरंगाबाद ...
बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी, हिची कबर आहे.ही कबर असलेला मकबरा औरंगजेबाच्याच काळात मलिकाच्या मुलाने-आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये बांधला. हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला असून, त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी या मिनारांवर जाता येत होते.
ही राबिया दुर्रानीची कबर २८ नोव्हेंबर, इ.स. १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली.
 
 
 गिरणा धरण हे भारतातल्या पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातले एक धरण आहे. १९५५ मध्ये धरण बांधकामासाठी कुदळ मारली गेली. १४ वर्ष सलग काम झाल्यावर १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण झाले. चाळीसगाव शहराच्या पश्चिमेला ४० कि.मी.वर नांदगाव तालुक्यात हे महाकाय गिरणा धरण आहे. गिरणा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असला तरी सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. गिरणा धरणापासून निघालेला डावा पांझण कालवा ५३ कि.मी. लांबीचा, उजवा जामदा २० कि.मी.चा, डावा जामदा ४०चा तर निम्न गिरणा काठ कालवा ६० कि.मी. लांबीचा आहे. या कालव्यांमुळे गिरणा खोर्याला सुपीकता व समृद्धता लाभली आहे. तथापि कालव्यांपासून होणारी गळती, पाटचार्यां दुरुस्तीची गरज हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. याबाबत गिरणा पाटबंधारे विभागाचे सतत दुर्लक्ष होत आहे. मालेगाव शहर, चाळीसगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा एकूण १२७ पाणीपुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हा एकमेव जिवंत पाण्याचा स्रोत आहे. मात्र याच योजनांद्वारे जळगाव जिल्ह्याच्या जवळपास पाऊण भागातील लोकसंख्येची तहान भागते. बिगर सिंचनासाठी धरणाचे पाणी दहीगाव बंधार्यापर्यंत प्रवास करते. पिण्यासाठी २ महिन्यांतून एकदा पाणी सोडले जाते.
 
 
 
145 वर्षाची परंपरा असलेली जळगावची रथ यात्रा......भाविकांच्या अलोट गर्दीत गेल्या दिडशे वर्षांपासून
दर कार्तिकी एकादशीला जळगावात भगवान श्रीरामची रथयात्रा निघते....
31 फूटाची उंची असलेला हा रथ सागवानाच्या लाकडापासून बनविलेला आहे. ....रथावर पुढे दोन अश्वमुर्ती आहेत. ....रथाचे सारथ्य अर्जून करतो ,त्याच्या आजूबाजूला गरूड आणि मारूतीच्या दोन मुर्ती आहेत. ....
प्रभूरामाची मुर्ती मुख्य रथात मधोमध विराजमान केली जाते तर आजूबाजूला लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती असते....संपूर्ण रथ झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवला जातो. ....तर संध्याकाळनंतर रथावर दोनअडीचशे बल्ब लावले जातात. ....
या रथयात्रेचे वैशिष्ट्य असे की शेकडो किलो वजनाचा हा रथ भाविक दोरखंडाने ओढतात..... एकाच वेळी शंभरावर भाविक रामनामाचा जयजयकार करत रथ ओढतात. ....रथाचे संतुलन जाऊ नये म्हणून चाकाला तज्ञ मोगरी (अडथळा ) लावतात.....
सकाळी नऊ वाजता यात्रा सुरू झाल्यावर दोन किलोमीटरचे अंतर पार करायला रथाला दहा ते बारा तास लागतात. ....रस्त्यात जागोजागी रथाचे स्वागत आरती होते. .....आणि दोन लाखाहून अधिक भाविक रस्तोरस्ती उभे राहून रथाचे दर्शन घेतात.....
या रथाला हिंदू मुस्लिम एकतेचीही परंपरा आहे. ....रथाच्या वाटेवर असलेल्या दर्ग्यातर्फे दरवर्षी रथाचे स्वागत केले जाते. ....
रथयात्रेच्या आधी आठ दिवस वहन ( छोटा रथ) निघतात. ....शहरातल्या विविध काॅलन्यांमध्ये या वहनाला पानसुपारीसाठी आमंत्रण असते ...त्या ठिकाणी भजन भारूडाचा कार्यक्रम होतो. ...
रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोंगे काढली जातात. ....हे सोंग म्हणजे पुरूष स्त्रियांचे रूप घेऊन तयार होतात. ...तोंडाला शेंदूर लावलेला असतो आणि पाठीवर मोरपीसाची मनोरम सजावट असते....हे सोंग गल्लोगल्ली जाऊन एका विशिष्ट तालावर नृत्य करतात.....
अशी ही रथयात्रा जळगावचे सांस्कृतिक वैभव आहे. ....
सार्वै युवा मित्र मंडळ 
 
 
 निम्न पांझरा अक्कलपाडा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा व महत्वपूर्ण प्रकल्प आहे. अक्कलपाडा प्रकल्पाचे बांधकाम झाल्यानंतर अक्कलपाडा धरण सात वर्षांनतर पहिल्यांदाच तुडूंब भरले आहे. या धरणाचा लाभ धुळे तालुका, धुळे शहर, शिंदखेडा तालुका, अमळनेर तालुका व अंश: साक्री तालुक्याला मिळणार आहे. या प्रकल्पासाठी मी आमदार असताना विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, वित्तमंत्री व तहसीलदार यांना दरमहा १५ स्मरण पत्रे तब्बल ३३ महिने नित्यनियमाने पाठवीत होतो. तसेच या प्रकल्पासाठी विधानसभेत आवाज उठवत सतत पाठपुरावा केला. असंख्य अडचणींनतर अक्कलपाडा प्रकल्पासाठी वेळोवेळी निधी मिळत गेला. आज अक्कलपाडा धरणाचे काम वक्राकार दरवाज्यासह १०० टक्के पूर्ण झाले असून हे धरण ३५ महिन्यात पूर्ण करू शकलो, याचा मला अभिमान असून आज अक्कलपाडा धरण तुडूंब भरलेले पाहताना मला मनापासून आनंद होत आहे. एका रॉकेलच्या डब्याची ही सारी करामत आहे. जनतेचा आशीर्वाद आणि प्रबळ इच्छाशक्तीमुळे हे सर्व मी करु शकलो.
 






 
नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैन !!
नागपंचमी २०१७
तिसर्या मजल्यावर नागचंद्रेश्वरची मूर्ती फक्त नाग पंचमीच्या दिवशी दर्शनासाठी खुली असते.
नागचंद्रेश्वर उज्जैन हा हिंदू भगवान शिवचा एक अद्वितीय प्रकटीकरण आहे आणि मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या तिसर्या मजल्यावर हे शिवलचे दुर्मिळ मूर्ति आहे. नागनाथदासवर म्हणून शिवाची ही दुर्मिळ मूर्ति केवळ श्रावण महिन्यात नागपंचमी दिवशी दर्शनासाठी खुली असते. नागचंद्रेश्वराचे दर्शन श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशीच होते. या स्वरूपात हिंदू भगवान शिव नागा (साप) आणि चंद्र (चंद्र) यांच्याशी अधिक संबंधित आहेत.
श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
शिवच्या मूर्तीवर्तुळाची वैशिष्ट्ये त्याच्या गळ्यात साप आहे
प्रत्येक वर्षी जगाला वाचविण्यासाठी भगवान विष्णूचे अनेक रूप आणि आकार आहेत. हिंदू धर्माच्या मते, शेशानग हे विष्णुच्या उर्जाचे स्वरूप आहे असे समजले जाते ज्याच्यावर तो विश्रांती घेतो.
सेशनाग केवळ यहोवासाठी विश्रांतीची जागाच देत नाही, तर त्याला देखील त्याचे संरक्षण करतो. आपण हे उपरोधिक आहे का? भगवान श्रीकृष्णांच्या जन्मावेळी ती शेशनाग होती ज्याने संत कृष्णाला वादळी वादळापासून वाचविले होते, तर त्याचे वडील वासुदेव त्याला नंदाच्या घरी घेऊन गेले. तर, हे निश्चितच रक्षणकर्ता आहे.
 
 
 
कानबाई माता उत्सव...
खान्देशाची आराध्य दैवत म्हणुन कानबाई उत्सव सर्वत्र उत्साहांत साजरी केला जातो.
नंदुरबार जिल्ह्यात रानमाळ,
शहादा तालुक्यातील प्रकाशा व धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे या गावात कानबाईचे मंदिर असल्याचे सांगीतले जाते. एका दिवसाच्या कानबाई मातेच्या सण,
उत्सव सर्व परिवार एकत्रित येवुन मोठ्या जल्लोषात साजरा करुण पार पाडला जातो.
खान्देशची ग्रामदेवता म्हणुन ख्व्याती असलेल्या
कानबाई मातेच्या
श्रावण महिन्यातील
नागपंचमीनंतरच्या
पहिला रविवारी कानबाई मातेच्या एक दिवशीय स्थापना करुण उत्सव खान्देशात सर्वत्र उत्सवाने साजरा केला जातो.
पुर्वी खानाचं राज्य होतं. खान्देश परिसराचा राजा खान ह्याना पुत्र प्राप्ति नसल्याने खान्देश प्रजेने नवस मानला. राजा खान याना कन्या रत्न प्राप्त झाले.
त्यावेळी जनतेने "खानबाई' उत्सव साजरा केला.
खानभाई उत्सवाला खान्देशात कालांतराने या उत्सवाला अप्रभ्रुष होवुन कानबाई म्हणुन ओळखले जाऊ लागले.
तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार हां खान्देश- कान्हादेश-खान्देशी लोक कान्हा म्हणजे भगवान कृष्णाला मानतात.
म्हणुन त्यानी देवीचा उत्सव साजरी सुरु करण्यासाठी कानबाई हे नाव घेतले
. असावे अशी समज आहे.
कानबाई हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी, या समाजात साजरा होतो.
मात्र आता प्रतेक समाजात कानबाई मातेची स्थापना भाविक मोठ्या प्रमाणात करीत असतात.

 

*कानुबाई* मातेच्या *रोट* प्रारंभ होणार आहेत. त्यानिमित्ताने गावात जय्यत तयारी सुरू आहे. महिला वर्गाची तर घरात साफसफाई करुन अक्षरशः दमछाक झाली आहे. नोकरवर्गांना तर आता फक्त बळसाणेचेच वेध लागले असुन त्यांच्या बॅगा आतापासूनच पॅक व्हायला लागल्या आहेत.
👉 आता काही VIP मंडळीला रोट ही काय भानगड आहे हे समजल नसणार किंवा अपुरी माहिती असणार मग आता आपण पुर्णपणे माहिती घेऊ.
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्य
ा पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो.
या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.
'कानबाई परनुन आणणे'
पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही.अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक,नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता चाळीसगावजवळ उमरखेडला कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात.
तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात.केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कण्हेरीला खान्देशात फार महत्व आहे. काही गाण्यांमधे कण्हेरीलाच कानबाई संबोधलं जातं.कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते)कटाची आमटी, लाल भोपळ्याची(डांगराची) भाजी, पापड, भजे हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
काहींकडे हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही.
नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो.


 जळगाव वरून चाळीसगाव कडे जातांना रस्त्याच्या डाव्या बाजूस अगदी सहजास दिसून येत एक प्राचीन मंदिर. मंदिराच्या बांधकामावरून लगेच हे हेमाडपंथी मंदिर असावे हे कळून येते. मुधाई देवी मंदिर,वाघळी असे या मंदिराचे नाव. तसा फलक जवळ गेल्यावर लगेच दिसून येतो. हे मंदिर एका आंशिक रूपाने नष्ट झालेल्या कृत्रिम दगडावर बांधलेले आहे. याचे बांधकाम इ स ११५० ते १२०० च्या आसपास केले गेले असावे. या पूर्वमुखी मंदिराची ताऱ्याच्या आकाराचे विधान असून त्यात एक गर्भगृह,अर्धमंडप व मंडपाची योजना आहे. या मंदिराचे पीठ,वेदिबंध तसेच जांघेचा भाग सुरक्षित असून शिखर नष्ट झालेले आहे. शिखराच्या जागी दगड आणि सिमेंट चे छत सुरक्षिततेसाठी तयार केले आहे. मंदिराच्या भिंती,रत्न,पाने,भौमितिक व ग्रासमुखाच्या आकृतींनी सुशोभित आहेत. मंदिराच्या उत्तर,पश्चिम आणि दक्षिणेस मध्यभागी भिंतीवर क्रमशः चंडिका ,सूर्य आणि गणेशप्रतिमा प्रामुख्याने विद्यमान आहेत.
मंदिराच्या आत दाराची चौकट, छत तसेच आधारस्तंभ यावर अत्यल्प अलंकरण आहे आणि याच्या गर्भगृहाची चौकट पाच शाखायुक्त असून ती वरील बाजूनी नवग्रह तर खालील बाजूस पाने भौमितिक आकारांनी सुशोभित आहे. द्वारशाखेवर एकावर एक दोन मुर्त्या घासल्या गेल्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड जाते . गर्भगृहात एका नंदीवर बसलेले उमा महेश्वर मूर्ती आहेत.
याच्या पुरातात्विक महत्त्वामुळे भारतीय पुरातत्व विभागाने यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.
 
 
 वणी नांदुरी घाट रस्ता


 
 
 
 https://www.facebook.com/khandesh2016/
 
 
 

बडगुजर समाजाची देवस्थाने

January 11, 2019 बडगुजर समाज 0

 काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले. येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिरात नियमित पूजाअर्चा होत असते. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंडपात प्रवचने व कीर्तने होत असतात. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. राममंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राममंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती अंतरा-अंतरावर सापडल्या जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड, सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वंयभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाण्याइतके आहे.

 

कालिमाथ
औरंगाबाद
तालुका कन्नड.
कालिमाथ केवळ अशीच जागा आहे जिथे कालीची तिच्या बहिणी लक्ष्मी आणि सरस्वतीसोबत पूजा केली जाते. देवी कालीचे मंदिर आहे, जे मोठ्या संख्येने भाविक वर्षभर भेट देतात, विशेषत: नवरात्रोवेळी..
 
 


 

 

 

 

 

बडगुजर समाजाची देवस्थाने:

  1. चामुंडा-चोटीला – जुनागड-गुजरात
  2. शेलू-मेथी-शिंदखेडा, धुळे जिल्हा
  3. चोपडा
  4. सुरत
  5. पिळोदे, ता. अमळनेर, जि. जळगांव

या मंदिर परिसरातील आपला ग्रुप फोटो तुम्ही पाठवू शकतात. निवडक फोटोंना या पेजवर प्रसिद्ध 
करण्यात येईल .

चामुंडा माता मंदिर, जुनागढ
डॉ. कमलेश बडगुजर, नाशिक सहपरिवार – चामुंडा माता मंदिर, चोटीला

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...