Tuesday, February 15, 2022

भंडारा डोंगर

 जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांनी गाथा लिहिली तो भंडारा डोंगरावर  त्या विषयी आज माहिती घेणार आहोत. देहू परिसरात तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले भंडारा व भामचंद्र डोंगर आहेत. भल्या पहाटे उठून तुकाराममहाराज आपली आध्यात्मिक साधना, भजन, लिखाण, चिंतन करण्यासाठी येथे जात असत. , भामचंद्र डोंगरावर ध्यानाला बसत. इंद्रायणी नदीच्या पलिकडे, देहूपासून  साधारण पाच किमी अंतरावर भंडारा डोंगर आहे.

देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तोच हा भंडारा डोंगर. देहूगावातील संत तुकाराममहाराज व आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे पाच किलोमीटरवर असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत मोटार रस्ता तयार केलेला आहे.तसेच या परिसरात जाण्यासाठी सोयीचे ठिकाण म्हणजे तळेगाव. तळेगाव परिसरात एक दिवसाची पावसाळी भटकंती कुटुंबीयांसह करू शकतो.  तळेगावच्या जवळ असलेली ही दोन्ही ठिकाणं व इंदुरीचा किल्ला मुंबई – पुण्यापासून एका दिवसात पाहता येतात.
 
तुकोबा अनेकदा या ठिकाणी चिंतनासाठी येत. त्यांच्या पत्नी जिजाबाई तुकोबांना शोधत, त्यांच्यासाठी भाकरी घेवून येथे येत. यासंदर्भात एक अत्यंत ह्द्य अशी आख्यायिका आहे. एकदा तुकोबांसाठी भाकर घेवून येत असताना जिजाबाईंच्या पायात काटा रुतला. डोक्यावर पाटी, हातामध्ये पाण्याची कळशी, जवळ बसायला पार वगैरे नाही. अशा अवस्थेत काटा काढणे अवघड झाले. तेव्हा देवानेच गुराख्याचे रुप घेवून तेथे येवून त्यांच्या पायातला काटा काढला.
      या डोंगराच्या नावाबाबत एक गोष्ट सांगितली जाते. एकदा छत्रपती शिवाजीमहाराज तुकाराममहाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. छत्रपतींच्या समवेत शेकडो मावळे वीर होते. एवढ्या माणसांना प्रसाद म्हणून जिजाबाईने आणलेल्या शिदोरीचे दोन दोन घास दिले तरीही ती शिदोरी संपली नाही. तरीही शेकडो मावळे छत्रपतींसह पूर्ण जेऊन तृप्त झाले. या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिले. भंडारा डोंगरावरही भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून दिले आहे. म्हणून या डोंगराला ‘भंडारा’ असे नाव दिले आहे.
    या डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सार्या विश्वाला मार्गदर्शक असणार्‍या गाथेची निर्मिती केली होती. भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे होतात. राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यासाठी येतात. येथे येणार्‍या सर्व भाविकांना तसेच वारकर्‍याना सप्ताहकाळात रात्रीपर्यंत महाप्रसाद दिला जातो. नित्यनेमाने दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था केली आहे.

कसे जावे : -
   १) मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर तळेगाव हे रेल्वे स्टेशन आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर ५ किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूस कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वाहनाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.
२) देहूगावातून येथे जाण्यासाठी व्यवस्था आहे. स्वत:चे वाहन असल्यास गाडी वर पर्यंत नेता येते.
३) पायथ्यापासून पायी जायचे झाल्यास अर्धा ते पाऊणतास लागतो.
 
 
        तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. भंडारा डोंगराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडयात झाला असल्याने याही ठिकाणी विकासकामे सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून या क्षेत्राला निधी मिळतो. सध्या भंडारा डोंगरावर जाणारा रस्ता मोठा व प्रशस्त बांधलेला आहे. अंदाजे ४० फुट रुंद असा हा रस्ता आहे. सुमारे २ ते अडीच किलोमीटर रस्ता डोंगरपायथ्यापासून मंदिरापर्यंत तयार केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकर्याना पदपथ निर्माण केला आहे. शासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवडी केल्याचे दिसून आले. भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूला जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे, सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते.
       ट्रीप, पिकनिक, मौजमजा, हुल्लाडबाजी करण्यासाठी येणार असाल तर हे ठिकाण नक्कीच नाही. असे करताना आढळल्यास भाविक भक्तांकडून ‘प्रसाद’ नक्की मिळेल.
        डोंगर उंचावर असल्याने छान गार हवा वाहते. एकदा तरी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसगार्चा आनंद घ्यावा.
भंडारा डोंगरावर जाणारा घाट रस्ता मस्तपैकी नागमोडी वळणे घ्यायला लावणारा आहे. घाट चढताना दिसणारा आजुबाजूचा परिसर सुरेख दिसतो. एक मोठे वळण घेऊन आपण माथ्यावर पोहोचतो. येथे तुकाराममहाराजांचे एक मंदीर असुन, काही वारकरी मंडळी त्याची देखभाल करतात. मंदिरात संत तुकाराममहाराज, विठोबा-रखुमाई, गणपती, शिवलिंग अशा मुर्ती आहेत. डोंगरावरील एकांत, आजूबाजूचा सुंदर निसर्ग, वार्याची झुळूक आपल्याला प्रसन्न करते. 
 


 
डोंगरावर तुकोबांचे एक छोटेसे मंदिर आहे. सध्या या मंदिराशेजारीच नवीन मंदिराचे बांधकाम चालू आहे.
वर उल्लेख केलेल्या आख्यायिकेची स्मृती जपणारे एक मंदिर सुद्धा या डोंगरावर आहे. या मंदिरात देव जिजाबाईंच्या पायातील काटा काढत आहे अशा प्रसंगाची मूर्ती आहे.

दिसणारा परिसर :

भंडारा डोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भामचंद्र डोंगर, इंद्रायणी नदी, इंदोरीगाव, जाधववाडी धरण परिसर, तळेगाव परिसर, घोरावडेश्वर डोंगर व अय्यप्पा स्वामींचा डोंगर व त्यामागे पसरलेले पिंपरी-चिंचवड शहर दिसते.

 या डोंगरच्या मागच्या बाजूस उतरण्यासाठी एक पायवाट आहे. या पायवाटेने १० मिनिटे खाली उतरुन गेल्यावर आपल्याला कातळात कोरलेली गुहा दिसते.(ही पायवाट चटकन सापडत नाही त्यामुळे मंदिरातील वारकरी किण्वा दुकानदारांना विचारावे). या मळलेल्या पायवाटेने १० मिनिटे खाली उतरल्यावर आपण प्राचिन बौध्द गुंफ़ेपाशी पोहोचतो.
या गुहेत वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी वास्तव्यास असतात. या गुहेसमोरच पाण्याचे एक कुंड आहे. गुहेच्या वरच्या बाजूला एक स्तुप आहे. लेण्याचे छप्पर कोसळल्यामुळे हा स्तुप उघडा पडलेला आहे. गौतम बुध्दाच्या प्रतिमे एवजी स्तुप आहे. त्यामुळे ही लेणी हिनयानकालिन आहेत. याशिवाय येथे एक दोन अर्धवट खोदलेल्या गुहा पाहायला मिळतात. 
 Bhandara Dongar (Leni), Dehu road, Dist Pune
Bhandara Dongar (Leni), Dehu road, Dist Pune

Bhandara Dongar (Leni), Dehu road, Dist Pune Bhandara Dongar (Leni), Dehu road, Dist Pune
   मात्र या बौध्द लेण्यांचे संशोधन अलेक्झांडर कनिंगहॅम याचेकडून झाले नाही.पुढे भारतीय पुरातत्व खात्याने १९५७-५८ मध्ये याचे संशोधन केले. स्थानिक लोकांमध्ये हि लेणी 'विठोबा-रुक्माईची लेणी' म्हणून प्रसिध्द आहेत. सध्या या ठिकाणी चार गुंफा दिसत असल्या तरी मुळात सहा गुंफा असाव्यात.ज्या झीज आणि पावसामुळे कोसळुन नष्ट झाल्यात. 
पहीलीच गुंफा आकाराने मोठी असून इथे आता विठ्ठक रुक्मिणी मंदीर झाले आहे.संत तुकारामांना विठ्ठलाने याच स्तुपात दर्शन दिले असे मानले जाते.आता इथे काही वारकरी मुक्काम करतात. 
  याच बरोबर इथे असलेल्या इतर अवशेषात उतारावर उघड्यावर कोरलेला स्तुप बघायला मिळतो. या स्तुपाच्या बाह्य अंगावर वेदीका बघायला मिळते.कदाचित इथे जाण्यासाठी लाकडी जीना असावा,सध्या मात्र थोडी काळजी घेउन सोपे प्रस्तरारोहन करुन इथे जाता येते. कदाचित या स्तुपावर लाकडी मंडप असावा.त्यासाठीच्या खाचा दगडात बघायला मिळतात
.मात्र सध्या हा स्तुप उन्हापावसात धुपत असल्यामुळे त्याची बरीच झीज झाली आहे.



  या स्तुपाच्या खालच्या अंगाला आणखी एक गुंफा बघायला मिळते. इथे पाण्याची काही टाकी बघायला मिळतात. मात्र इथे कोणताही शिलालेख नसल्यामुळे या लेण्यांचा कालावधी निश्चित करता येणे शक्य नाही.मात्र हि लेणी कदाचित इ.स. ३ र्‍या शतकातील असावी.
याच लेण्याच्या परिसरात आपल्याला घोरावडेश्वर ( शेलारवाडीची लेणी ) भामचंद्र डोंगर आणि नानेलीची लेणी बघायला मिळतात.पायथ्याशी नवलाख उंबरे हे गाव आहे,जे कदाचित या परिसरातील व्यापारी मार्गावरील महत्वाचे गाव असावे. 
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) http://trekshitiz.com/discussionboard/_topic291.html  हि वेबसाईट
३) www.warkari.wordpress.com  हे ब्लॉग


भामचंद्र डोंगर (भामगिरी / भांबगिरी / भामचंद्र डोंगर )

     जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व परमेश्वराच्या भेटीसाठी तब्बल पंधरा दिवस तहानभूक विसरून तुकाराममहाराजांनी जिथं समाधी लागाली, ते ठिकाण म्हणजे भामचंद्राचा डोंगर किंवा भामगिरी. तुकाराममहाराजांची घोरवाडेश्वर, भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्र डोंगर ही अभंग लिहिण्याची प्रेरणास्थळे होती. येथील शांत व सुंदर वातावरणामुळे विठ्ठलाची आस लागलेल्या महाराजांना निर्गुण, निराकार विठ्ठलाची भेट झाली. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तो भंडारा डोंगर याच भंडारा डोंगराच्या समोर कातळकड्याची जणूकाही उलटी टोपी घालून निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात समाधी लावून बसलेला भामचंद्र डोंगर आहे.

धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥

तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंगामुळे. देहूगावातील संत तुकाराममहाराज व आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा व भामचंद्र डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे १२ ते १३ किलोमीटरवर असलेल्या भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे. 

 

     भामगिरी डोंगररांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे. नवलाख उंबरे हे महत्वाचे व्यापारी मार्गांवर वसलेले गाव महाराष्ट्र राज्यात, पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे च्या उत्तरेला वसलेले आहे. या गावाच्या उत्तरेला तसूबाई डोंगर रांग आहे.तसूबाई डोंगर रुंद पश्चिम-पूर्व पसरलेली आहे. तसूबाई डोंगरारांगेच्या पूर्वेकडच्या टोकाला भामचंद्र डोंगर आहे. या डोंगररांगेच्या उत्तरेस भामा नदीचे खिरे आणि दक्षिणेस इंद्रायणी नदीचे खोरे आहे. भामा नदीवरून भामचंद्र असे नाव डोंगराला पडले आहे. वसुळी, भाम्बोली आणि शिंदे गावाजवळ असलेल्या भामचंद्र डोंगरावर भामचंद्र लेणी आहेत. या भागात नानोली, इंदुरी आणि शेलारवाडी येथे हीनयान बुद्ध लेणी ( नंतरच्या काळातली ) आहेत. शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या टेकडीत लेणीसमूह आहे. या लेणीसमूहात सहा लेणी/गुहा आणि पाच पाण्याची टाकी आहेत. संत तुकाराम या ठिकाणी येत असत. संत तुकारामांनी येथे घेतलेल्या अनुभूतीचा उल्लेख त्यांच्या अभंगात केला आहे. लेणी स्थानिक लोक "भामचंद" या नावाने ओळखतात. भामचंद्र लेणी पुणे शहरापासून ४० किलोमीटर आणि तळेगाव पासून अंदाजे १८ किलोमीटर अंतरावर आहेत. लेणी जरी खेड तालुक्यात असली तरी मावळाच्या जवळ आहेत. भामा नदी च्या खोऱ्या च्या दक्षिणेला असलेल्या या डोंगराचे नाव भामा नदीवरून पडले आहे. भामचंद्र महादेवस्थानाकडे भांबोली येथे जागा आहे, असा उल्लेख आहे. 

  
 DSCN4742.jpg
 भामचंद्र डोंगर तसा आडवाटेवरचा. एखाद्या तपस्वी मुनीप्रमाणे समाधी घेऊन एकांतात तपश्चर्या करीत बसलेला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटल्याने एकटा पडलेला, दाट झाडी असलेला. भामचंद्र डोंगररांग पूर्वकडून पश्चिमेकडे पसरली आहे. भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला आहे पायथ्यापासून अर्ध्या उंची पर्यंत गच्च झाडी आहे. त्यावरील भागात सुमारे ८०० ते ९०० फूट कातळकडा आणि तोही उलटी टोपीच्या आकाराचा. याच काताळात गुहा आहेत. डोंगरावरील एकंदरीत झाडीवरून तुकोबामहाराजांच्या काळात या ठिकाणी यापेक्षाही दाट झाडी असणार. डोंगर परिसर व आजुबाजूच्या परिसरात त्याकाळी चांगले जंगलच असणार याची खात्री होते.या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत.

  संसारात राहून, व्यापार सांभाळून विठ्ठल भक्ती करणार्‍या तुकाराम महाराजांना दैनंदिन व्यापातून ईश्वर भक्तीसाठी वेळ देता येत नसे. त्याची खंत त्यांनी अनेक अभंगांमधून व्यक्त केलेली आहे.

संसारतापे तापलो मी देवा !
करीता या सेवा कुटुंबाची!!
कसया गा मज घातिले संसारी!
चित्त पायावरी नाही तुझ्या !!

किंवा

मन माझे चपळ न राहे निश्चळ!!
घडी एक पळ स्थिर नाही !!

अशा मनाच्या अवस्थेत तुकोबारायांना भामगिरीवर जाऊन ध्यानधारणा करण्याची आज्ञा झाली. 
     ईश्वरप्राप्तीसाठी महाराजांनी भंडारा, भामचंद्र व घोरावडेश्वर सारख्या एकांतवास असलेल्या ठिकाणी समाधी लावून विठ्ठलाचे चिंतन केले. एकदा तुकाराममहाराज घरी परत न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा आजुबाजूच्या परिसरात त्यांना शोधू लागले. शोधत-शोधत ते भामचंद्रावर आले. तेथे त्यांना तुकाराममहाराज दिसले. निवार्णीचा संकल्प करून तब्बल पंधरा दिवस महाराज ध्यान करत होते. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागले. वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला. साक्षात ईश्वर प्रकट होऊन त्यांचे रक्षण केले. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले,  आसन मोडल नाही. शेवटी दिव्याच्या ज्योती जवळ धरलेला कापूर ज्याप्रमाणे ज्योतीशी एकरूप होतो तसा तुकारामांचा देह श्रीहरीशी एकरूप झाला, त्यांना साक्षात्कार झाला. त्याच वर्णन तुकोबांनी अभंगातून केलेल आहे.

पंधरा दिसामाजी साक्षात्कार झाला !
 विठोबा भेटला निराकार !!
भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली !
वृत्ति स्थिरावली परब्रम्ही !!
निर्वाण जाणोनी आसन घातिले !
ज्ञान आरंभिले देवाजीचे !!
सर्प, विंचू, व्याघ्र अंगासी झोंबिले!
पिडू जे लागले सकळीक !!
दिपकी कर्पूर कैसा तो विराला!
त्तैसा देह झाला तुका म्हणे !!

त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्यानंतर कान्होबांनी येथे तुकोबांची प्रतिमा कोरून घेतली. मूर्तीच्या मागे विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.


 
 map of dehu.jpg
कसे जावे :
१)  पुणे-मुंबईकडून रेल्वेने येत असाल तर रेल्वेमार्गावर तळेगावला उतरून एसटी, अथवा खासगी वाहनाने तळेगाव चाकण रस्त्यावरील संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. मात्र हा रस्ता दगडी असल्याने शक्यतो या फाट्याच्या पुढे चाकणहून भामचंद्र डोंगराकडे जाण्याचा रस्ता चांगला आहे.
२)  तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर जाता येते. (वसुली हे गावाचे नाव आहे.). येथे डाव्या बाजूला शिंद, भांबुर्ले गावाकडे जाणारा रस्ता पकडावा. नाक्यापासून भांबुर्ले १.५ किमीवर आहे. भांबुर्ले गावातून उजव्या बाजूचा रस्त्याने १ किमीवरील भामचंद्र माध्यमिक विद्यालया पर्यंत जावे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या (विद्यालयाच्या बाजूने) कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते. डोंगराच्या पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे.
३) पुण्यातून स्वत:चे वाहन घेऊन येणार असाल तर सकाळी लवकर ७ पर्यंत निघून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून पिंपरी, चिंचवड, निगडी येथील भक्ती शक्ती शिल्पसमूहानंतर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड लागते. तेथून संत तुकाराममहाराज देवस्थानची स्वागत कमान लागते. तेथून देहूगाव असा मार्ग आहे. देहूगावात गेल्यावर तुकाराममहाराजांचे मंदिर व गाथा मंदिर पाहण्यास विसरू नका. सुंदर मंदिर बांधले आहे. तेथून भंडारा डोंगर दिसतो. देहूगावातून तळेगाव चाकण महामार्गावर भंडारा डोंगर आहे. आंदाजे अंतर ८ किलोमीटर भरेल. वाटेत म्हणजे देहूगाव ते तळेगाव चाकण महामार्गाचा रस्ता सध्या दुरुस्त करत असल्याने थोडासा खराब आहे. अंदाजे २ किलोमीटरचा. तेथून डावीकडे वळून भंडारा डोंगरावर वरपर्यंत गाडीने जाता येते. सुंदर रस्ता तयार केलेला आहे.स्वत:चे वाहन असल्यास एक दिवसात देहूगाव, गाथा मंदिर भंडारा व नंतर भामचंद्र, इंदुरीचा किल्ला अशी एक दिवसाची छोटी ट्रिप होईल. भामचंद्र डोंगराच्या पाथय्यापर्यंच वाहन जाते. तेथून पुढे १५ ते २० मिनटे पायपीट करून डोंगरावर जाता येते. शक्यतो अंधार पडायच्या आत डोंगरावरून खाली यावे. वाटेत कुठेही खाण्याचे पदार्थ मिळत नाही.
    चाकणमार्गे भामचंद्र पाथया अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.  
कसे काय पहाल :
पुण्यातून प्रथम
१) देहूगावातील गाथा मंदिर
२) भंडारा डोंगर (गाडीवरपर्यंत जाते)
३) भामचंद्र डोंगर (पायी जावे लागते. अंदाजे २० ते २५ मिनिटे)
४) भामचंद्र डोंगर पाहून झाल्यावर आलेल्या मार्गाने देहूगावाकडे न जाता तळेगाव चाकण रस्त्यावरून तळेगावला जाणे वाटेत इंदुरीची गढी आहे. 
 ५) चाकण - तळेगावमार्गे परत तळेगावाला येऊन तेथून पुढे जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने सोमाटणे फाट्याजवळील शिरगाव (प्रती शिर्डी) पाहण्यास विसरू नका.
 
  स्थलदर्शन :-
       तळेगाव-चाकण महामार्गावर भंडारा डोंगराच्या पुढे गेल्यावर देहूगावातून येताना एक फाटा लागतो. या फाट्याकडे न जाता संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. हे अंतर कापण्यासाठी तब्बल पाऊणतास जातो. कारण अर्थातच रस्ता. मोठे मोठे दगड टाकून कच्चा रस्ता तयार केलेला आहे. काही ठिकाणी जेमतेम बरा रस्ता म्हणता येईल असा रस्ता आहे.
 
 
 Bhamchandra Caves
  तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. पर्यटकांचा ओढा या तीर्थक्षेत्राकडे वाढला आहे. मात्र, प्रशासन रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कंबरतोड रस्ता पार करून डोंगराच्या पायथ्याशी पोहोचायचे. डोंगरावरील एकंदरीत झाडीवरून तुकोबामहाराजांच्या काळात या ठिकाणी यापेक्षाही दाट झाडी असणार. डोंगर परिसर व आजुबाजूच्या परिसरात त्याकाळी चांगले जंगलच असणार याची खात्री होते.
 
  झाडीतला रस्ता संपवून छोटेसं पठार लागत. या पठावरावर दगडांनी बांधलेला चौथरा आहे.
 
 येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे.वासकरमहाराज या ठिकाणी कीर्तन करीत. तेथून पुढे निघालो या ठिकाणी सातवाहनकाळातील लेण्या आहेत. 
 लेणे क्रमांक १ :
   शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक १ कोरले आहे.येथे थोड्याश्या उंचीवर कातळात खोदलेल टाक आहे. टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे. हे लेणे दक्षिण-पश्चिम मुखी आहे. सध्या तेथे महादेवाची पिंड असलेले देऊळ आहे. लेण्यात आतल्या बाजूला एक गर्भगृह आणि मंडप आहे. यात गणपती आणि इतर या देवतांच्या मूर्ती आहेत. लेण्यात एक मंडप आहे. लेण्यात कोणतेही बौद्ध नक्षीकाम नाही. हा डोंगर प्राचीन व्यापारी मार्गाजवळ आहे. संत तुकाराम या लेण्यात येत असत असे समजतात. स्थानिक लोक या लेण्याला विठ्ठल रखुमाई लेणे असे संबोधतात. मंदिराच्या शेजारील गुहेत लोखंडी जाळ्या ठोकून बंद केलेली आहे. तिचा उपयोग वारकरी धर्मशाळेसारखा करतात. 
 


 

   या लेण्यांच्या गर्भगृहात चार कोपऱ्यात चार अर्धे खांब आहेत. गर्भगृहात महादेवाची पिंड आहे. गर्भगृहात जाण्यास असलेल्या दरवाजाची चौकट दगडी बांधीव आहे. हि चौकट मूळ लेण्यांचा भाग नाही. जोडकाम स्पष्ट दिसते. चौकटीवर गणपती, कीर्तिमुख, द्वारपाल आणि इतर आकृत्या कोरल्या आहेत. मंडपात चार खांब आहेत. दोन बाजूला दोन देवकोष्ट आहेत. लेण्यांची त्रिमिती बेढब आहे. भिंती समांतर नाहीत. खांब वाकडे आहेत. एका खांबावर गणपती अर्धवट कोरला आहे. लेणे तेलरंगात रंगवल्यामुळे आणि शिल्प शेंदूर फासल्यामुळे , त्यांचे मूळ सुंदर रूप झाकोळले आहे असे वाटते. 
 

लेण्यांच्या मंडपाचा दर्शनी भाग बांधीव आहे. बाहेर एक पाण्याचे टाके आहे.

लेणे क्रमांक २ :
  शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक २ कोरले आहे. हे लेणे दक्षिण-पश्चिम मुखी आहे. हे लेणे लेणे क्रमांक १ च्या उत्तरेला आहे.  काही विद्यार्थी इथ राहून संतपंरपरेचा अभ्यास करतात. येथे पूर्वी एक लहान कोरलेली गुहा होती. आता तेथे मोठी गुहा बनविण्यात आली आहे. अंदाजे १० मीटर लांब आणि ८ मीटर रुंद अशी हि आधुनिक गुहा वारकरी संप्रदायाचे अनुयायी वापरतात. एका बाजूला जुन्या मूळ गुहेच्या खुणा छतावर आढळतात.

लेणे क्रमांक ३ :
शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक ३ कोरले आहे. हे लेणे दक्षिण-पूर्व मुखी आहे. हे लेणे लेणे क्रमांक २ च्या उत्तरेला आहे. 
 
जेमतेम एक माणूस वर किंवा खाली येऊ शकेल अशा दगडात पायर्‍या खोदून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला रेलिंगची सोय केल्यामुळे सुरक्षा वाढली आहे. अंदाजे पन्नास ते साठ पायर्या चढून वर गेलो कि तेथेही एक छोटी गुहा आहे. गुहेची अंदाजे उंची ६ फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे. गुहेची लांबी अंदाजे १० फूट व रूंदी ६ फूट आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आतमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. संत तुकारामांचे साधे पण प्रभावी भित्ती शिल्प येथे आहे. त्यांच्या हातावर विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.भामचंद्र डोंगरावराचा तुकारामांच्या अनुभूतीचा उल्लेल्ख असलेला त्यांचा अभंग येथे वाचावयास मिळतो. दाराबाहेर कोंदणात मारुती आहे.  
 DSCN4774.jpg
 
 
 
Bhamchandra Caves
 गुहेत शिरल्यावर गुहेतल्या शांततेने आपल्यावर गारूड होते. तुकाराम महाराजांच्या मुर्ती समोर बसून अलगद डोळे मिटून घ्यावे आणि ध्यान धरावे. सभोवतालच्या नितांत शांततेमुळे मनही स्थिर होत जाते. याठिकाणी कित्येक साधक साधना करुन गेले असावेत. अशा पवित्र ठिकाणी ५ मिनिटे का होईना आपल्याला शांतपणे बसता येणे , अंतर्मुख होता आले तर तो अनुभव कायमस्वरुपी लक्षात राहील असा असतो.
 तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे.
 
 गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे. त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मुर्ती आहे.  मुख्य गुहेतून खाली आलो कि लेणे क्रमांक २ ची गुहा  दिसते. या गुहेच्या बाजूला ३ फूट उंच व ६ फूट लांब गुहा आहे. या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे.
 लेणे क्रमांक ४ :
  शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक ४ कोरले आहे. हे लेणे दक्षिण-पूर्व मुखी आहे. हे लेणे क्रमांक ३ च्या बाजूला आहे. . हि एक मूळ नैसर्गिक गुहा आहे.

लेणे क्रमांक ५ :
    शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणे क्रमांक ५ आहे. हे लेणे दक्षिण-पूर्व मुखी आहे. हे लेणे क्रमांक ३ च्या पश्चिमेला आहे. येथे वारकरी संप्रदायाचे अनुयायी राहतात. हि एक मूळ नैसर्गिक गुहा आहे. आत पाणी येऊ नये म्हणून लेण्यांच्या बाह्य भागावर वरच्या बाजूला चर कोरले आहेत.

लेणे क्रमांक ६ :
   मुख्य लेणीसमूहाच्या पश्चिमेस कड्यात एक लहान गुहा आहे. हि एक नैसर्गिक गुहा आहे. गुहेच्या पुढच्या बाजूस एका बाजूला दगडी भिंत बांधली आहे. गुहा अंदाजे २ मीटर बाय २ मीटर आहे.

पाण्याच्या टाकी क्रमांक १: लेणे क्रमांक १ च्या बाहेर दक्षिणेला जवळच १ पाण्याचे मोठे टाके आहेत. यात पाणी नाही. कातळात थोडे उंचावर कोरलेले हे थोडे झाकलेले टाके भामा खोर्यातल्या इतर लेण्यांमधील टाक्यांशी मिळते जुळते आहे. या पाण्याच्या टाक्यात अंदाजे २४००० लिटर पाणी मावते. स्थानिक लोक या पाण्याच्या टाक्याला सीतेची न्हाणी असे म्हणतात.
Bhamchandra Caves
पाण्याच्या टाकी क्रमांक २: लेणे क्रमांक १ च्या बाहेर लगतच जवळच हे पाण्याचे लहान टाके आहेत. यात पाणी आहे. या पाण्याच्या टाक्यात अंदाजे ११४०० लिटर पाणी मावते.
पाण्याच्या टाकी क्रमांक ३: लेणे क्रमांक २ च्या बाहेर लगतच जवळच हे पाण्याचे मोठे उघडे टाके आहे. यात पाणी आहे. हे टाके पुरातन नाही. वारकरी संप्रदायाने हे टाके बनविले आहे.
पाण्याच्या टाकी क्रमांक ४: लेणे क्रमांक ३ कडे जाणार्या पायऱ्याच्या पश्चिमेला कातळात हे पाण्याचे मोठे उघडे टाके आहे. यात पाणी नाही.
पाण्याच्या टाकी क्रमांक ५: लेणे क्रमांक ६ च्या जवळ हे टाके आहे.
डोंगराच्या पश्चिम पायथ्याला एक हनुमान मंदिर आहे. जवळच एक जुनी दगडी विहीर आहे. या विहिरीचे बांधकाम रोकडोबा नावाच्या वारकऱ्याने अंदाजे १०० वर्षांपूर्वी केले असे सांगितले जाते.
संदर्भ :-
१)  पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) श्री विवेक काळे यांचे लिखाण
३)  https://samantfort.blogspot.com/2013/06/blog-post.html,
http://ferfatka.blogspot.com/2013/10/blog-post_20.html,
https://travfoodie.com/bhamchandra-caves-excited-bhamchandra-hill-trek/
https://kevinstandagephotography.wordpress.com/2019/03/10/bhamchandra-caves-bhamboli/
https://www.whatshot.in/pune/these-isolated-caves-near-pune-look-like-theyre-straight-out-of-ali-baba-40-thieves-film-c-30591
हे ब्लॉग


















These Isolated Caves Near Pune Look Like They’re Straight Out Of Ali Baba 40 Thieves’ Film!

Discover with

Pune has many beautiful forts in its periphery which have been attracting history buffs for years. And while you must be proud that you have explored all of them (or atleast most of them), we bet you wouldn’t have even heard about this bunch of caves that have been hiding in plain sight. Don’t believe us? Read on.

 

caves

Just 40 kms north from Pune lies the lesser known Bhamchandra caves. The place has six natural caves in total and even though the caves are still isolated from the world, the area surrounding it is sprawling with massive constructions mostly by the automotive industry. The trek to these caves is moderate to hard and one has to climb a steep hill to reach. The trek is definitely not for beginners or those who are trying their hands at trekking for the first time.    

Also Read: We’ve Got You The List Of What’s Hot In Pune From The 29th April To 1st May Weekend

caves

Now coming to the caves, the first cave you will come across will be on your right. It is quite easy to identify this cave as it has a small bricked door for an entrance. Inside the cave lies small shrines to many deities including Lord Ganesh, Lord Shiva and others. The interior of the temple, even though in shambles, is quite colourful. Besides this, the temple also has many sculptures of females and floral carvings in the walls.  

caves

As you move on, you will find the second cave just a few meters from the first cave. This cave has been enlarged to be converted into a hall for the monks who live here. Reaching the other caves is relatively tricky as there is barely a clear path to walk on. However, there is an iron railing to support you if you wish to go ahead. Even though other caves are smaller than the first and the second cave but do have beautiful murals of Sant Tukaram in meditative pose here.   
A visit here is nothing short of an adventure especially for those who love to explore hidden spots. . So all you explorers out there, put on your shoes, get those maps out and embark upon the adventure, already!
Note: Don’t forget to carry a water bottle with you. 









y and Society, Problems of Interpretation, by D. D. Kosambi 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...