Monday, June 21, 2021

लेण्यांविषयी सर्वकाही

सह्यद्री, महाराष्ट्राचा मानिबदू! या सह्यद्रीच्या कडेकपाऱ्यांतून इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. सह्यद्रीमध्ये निर्माण झालेल्या गडकोटांच्या यशोगाथा जगप्रसिद्ध आहेत. याच सह्यद्रीच्या उदरात सुमारे दोन हजार वर्षांपासून महाराष्ट्रातील कारागिरांनी केवळ छिन्नी-हातोडय़ाचे घाव घालून अनेक लेणी निर्माण केली. भारतात असलेल्या एक हजार लेणींपकी ८०० लेणी या महाराष्ट्रातच आहेत. बहुतांश ठिकाणी पांडवलेणी म्हणून ओळखली जाणारी आणि काहीशी पडकी भासणारी ही लेणी निरखून पाहिली तर त्यांच्या स्थापत्यातून, तिथे कोरलेल्या मूर्तीतून, दानलेखांतून त्यांच्या निर्मितीची कथा उलगडत जाते. काही अपूर्ण राहिलेल्या लेणीदेखील आपल्याशी उत्तम संवाद साधतात. अजिंठा, कान्हेरी, नाशिक येथील लेणींमध्ये कोरलेल्या दानलेखांतच लयन हा शब्द वापरलेला आहे. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लेणींच्या निर्मितीची ओळख करून देणारी ही लेखमाला.

लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फेकल्या गेलेल्या लाव्हाचे एकावर एक थर पसरत गेले आणि त्यातून निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची आणि सह्यद्रीची! याच सह्यद्रीच्या उदरात ही लेणी आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या १५ ते ६० मीटर उंचीच्या कातळामुळे लेणीनिर्मितीला उत्तम पाश्र्वभूमी लाभली. त्याचबरोबर सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट अशा विविध राजवटींच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींनी तसेच व्यापारी, भिक्षू, सामान्य नागरिक, इत्यादिंनी दानं दिल्यामुळे महाराष्ट्रात बौद्ध, िहदू व जैन धर्मीयांच्या लेणींची निर्मिती झाल्याचे पुराव्यांवरून दिसून येते. त्यामुळे भारतात असलेल्या एक हजार लेणींपकी ८०० लेणी महाराष्ट्रातच आहेत.

इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकात मौर्यवंशीय सम्राट अशोकाच्या काळात भारतात बौद्ध धर्माचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर झाला होता. सम्राट अशोकाचे प्रस्तरलेख आणि स्तंभलेख हे अफगाणिस्तान, पाकिस्तानपासून दक्षिण भारतापर्यंत पसरलेले आहेत. महाराष्ट्रात पौनी येथे उत्खननात सापडलेला स्तूप हा मौर्य काळातील स्तूप असावा असे संशोधकांचे मत आहे. मुंबईजवळ सोपारा येथेही विटांनी बांधलेला स्तूप तसेच अशोकाचे शिलालेखही सापडले आहेत. भगवान बुद्धांच्या सूचनेनुसार वर्षभर धर्मप्रसारासाठी फिरतीवर असणारे बौद्ध भिक्षू पावसाळ्यातील निवासासाठी (वर्षांवासासाठी) तात्पुरता निवारा उभारत. प्राचीन बौद्ध ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ही वर्षांवासाची जागा गावाच्या अथवा शहराच्या सीमेबाहेर परंतु शहरापासून जवळ असे. कारण भिक्षेसाठी एखादं गाव जवळ असणे गरजेचे होते. त्यामुळे अनेक बौद्ध स्तूप आणि विहार हे गावाच्या जवळ उभारले जाऊ लागले.

प्राचीन हिंदुस्थानी धर्मात लोकदेवतांचे स्थान खूप महत्त्वाचे होते. बौद्ध, हिंदू आणि जैन या सर्व धर्मियांचे आपापले स्थानिक देव किंवा यक्ष-यक्षी या स्वरूपातल्या रक्षक देवता होत्या. महाराष्ट्रातील अनेक बौद्ध लेण्यांमध्ये चैत्यगृहांच्या प्रवेशद्वारापाशी त्यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. पण त्या यक्ष-यक्षी किंवा देवांच्या मूर्ती आहेत असे आपण समजतो. त्यासंबंधीचा कोणताही अभिलेखीय पुरावा तिथे नसतो. पण याला अपवाद म्हणजे नाशिक येथील चैत्यगृह. इथे चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी एका व्यक्तीचे शिल्प कोरले आहे. पण त्याच्या मागच्या भिंतीवरील शिलालेखात त्याचा यक्ष असा उल्लेख केला आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा अभिलेखीय पुरावा आहे. इ.स.च्या 7व्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘महामायुरी’ नावाच्या बौद्ध ग्रंथात सतत प्रवास करणाऱया बौद्ध भिक्षूंना सर्पदंशापासून वाचण्यासाठी काही रक्षामंत्र किंवा कवचमंत्र दिले आहेत. तसेच ते ज्या प्रदेशात असतील तिथल्या स्थानिक देवता किंवा यक्षांनाही आवाहन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील तत्कालीन सर्व महत्त्वाच्या व्यापारी आणि धार्मिक केंद्रांची यादी तसेच तिथल्या स्थानिक रक्षक देवता आणि यक्ष यांच्या नावांची यादी या ग्रंथात दिली आहे. त्यात नाशिक येथे ‘सुंदर’ नावाचा यक्ष होता असा उल्लेख आढळतो. वर उल्लेखिलेला चैत्यागृहाच्या बाहेरचा यक्ष हा तो ‘सुंदर’ नावाचा यक्ष होता का हे सांगता येणे अवघड आहे. पण हा नाशिकचा प्राचीन रक्षक यक्ष आता पूर्णपणे विस्मृतीत गेला आहे हे नक्की.


वर उल्लेखिलेल्या पश्चिमी क्षत्रप राजा नहपान याच्याशी सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने नाशिकजवळच्या गोवर्धन नावाच्या गावाजवळ घनघोर युद्ध केले. त्या युद्धात नहपान याचा दारुण पराभव झाला आणि त्यांचा वंश ‘निरवशेष’ झाला. सातवाहनांचे गेलेले राज्य परत मिळाले. या सर्व घटनांचा उल्लेख त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखांमध्ये आढळतो. एवढेच नव्हे तर या विजयाचे प्रतीक म्हणून नहपानाच्या चलनात असलेल्या चांदीच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने स्वतःचे चिन्ह पुनर्मुद्रांकित केले. नशिकजवळच्या जोगळटेम्बी नावाच्या गावाला 1904मध्ये नहपानाच्या 13230 नाण्यांचा संग्रह अचानक सापडला. त्यामधील 9270 नाण्यांवर गौतमीपुत्राने स्वतःचे चिन्ह पुनर्मुद्रांकित केले होते. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, या ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ (म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्रांचे पाणी पितात म्हणजे तिथे पोचलेले आहेत) असे विशेषण मिळालेल्या गौतमीपुत्र सातकर्णीने शकांवर जो मोठा विजय मिळवला त्याप्रीत्यर्थ त्याने ‘शालिवाहन शक’ हा संवत्सर सुरू केला. परंतु हा शक सातवाहनांनी कधीही वापरला नाही, याचे खरे कारण त्यांनी तो सुरूच केला नाही. नहपानाचे गुजरातमधले राज्य कार्दमक क्षत्रप या दुसऱया शक घराण्यातला राजा चष्टन याने ताब्यात घेऊन एक संवत्सर इ.स. 78मध्ये सुरू केला. तोच पुढे शक संवत्सर नावाने प्रसिद्ध झाला. शालिवाहन म्हणजे सातवाहन यांनी एका शक राजाला हरवल्यानंतर जो दुसरा शक राजा गादीवर आला त्याने हा सुरू केला, ही वस्तुस्थिती आपण काही प्रमाणात स्मरणात ठेवली आणि काही प्रमाणात विसरलो.


काळाच्या ओघात सातवाहनांच्या साम्राज्याचा ऱहास झाला आणि या परिसरात आभीर राजांचे राज्य आले. त्रिरश्मी बौद्ध लेणी समूहात त्यांचा शिलालेख आढळतो. याच आभीर राजांचे वंशज म्हणजे आजचे आहेर आणि त्यांची भाषा ती अहिराणी. काही अभ्यासकांच्या मते त्यांच्या कान्हाचा देश खानदेश. पुढे बौद्ध भिक्षूंनी या लेणी सोडल्यावर तिथे इ.स.च्या 11व्या–12व्या शतकात जैन धर्मियांचा प्रभाव वाढलेला दिसतो. म्हसरूळजवळ चामरलेणी तयार झाल्या तर त्रिरश्मी बौद्ध लेणी समूहात काही लेण्यांमध्ये जैन तीर्थंकरांच्या मूर्ती कोरण्यात आल्या असे दिसते. तसेच अंजनेरी येथे जैन मंदिरांचेही बांधकाम झाले. अंजनेरी पर्वत, अंकाई-टंकाई, मांगी तुंगी या ठिकाणी जैन लेणी कोरली गेली. अशा प्रकारे मुळातच अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या या परिसरात सर्व धर्मियांनी आपापल्या धार्मिक स्थापत्याची उभारणी केली. मांगी तुंगी येथे उभ्या केलेल्या 108 फूट उंचीच्या तीर्थंकरांच्या मूर्तीची 2016 साली गिनीस बुकात नोंद झाली आहे. एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले एक प्राचीन काळापासून समृद्ध व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले नगर सर्व प्रकारच्या लोकांना आपला आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी इथे आकर्षित न करेल तरच नवल होते. त्यातून गोदावरी नदीचे माहात्म्य सर्वश्रुत होतेच. सिंहस्थाच्या वेळेस भरणाऱया कुंभमेळ्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात या परिसराची ख्याती पसरली होती. नाशिक आणि त्र्यंबक या अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या नगरांमध्ये विविध प्रकारचे धार्मिक, पितरांसाठीचे विधी करण्यासाठी हिंदुस्थानभरातून लोक येऊ लागले. काळाच्या ओघात अनेक राजवटींनी या प्रदेशात राज्य केले, व्यापार उदीम वाढायला मदत केली, अनेक मंदिरे बांधली, किल्ले बांधले आणि येथील भरभराटीस हातभार लावला. जरी मध्ययुगात नाशिकचे नाव गुलशनाबाद झाले तरी या गावाच्या धार्मिक महत्त्वात, नावलौकिकात काहीही फरक पडला नाही. काही काळाने ते परत नाशिक या नावाने ओळखले जाऊ लागले.

इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकात महाराष्ट्रात सातवाहन घराणे उदयाला आले होते. याच काळात भारताचा ग्रीस व रोमबरोबर व्यापार समुद्रमार्गाने व्यापार सुरू झाला होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या सुरुवातीला या व्यापाराला नर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या शोधाने मोठी चालना मिळाली आणि नर्ऋत्य मोसमी वारे शिडात भरून सागरी मार्गाने दरवर्षांला १२० रोमन जहाजे व्यापारासाठी भारताच्या किनाऱ्यावर येऊ लागली.

सातवाहन काळात महाराष्ट्राच्या भूभागातील व्यापारी मार्ग दक्षिणापथ या नावाने ओळखला जात असे. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रिअन सी’ या १९०० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या खलाशांच्या मार्गदर्शक पुस्तिकेतही या दक्षिणापथाचा उल्लेख आढळतो. याच पुस्तिकेत महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठा म्हणून तेर आणि पठण या शहरांचा तसंच कल्याण, चौल, सोपारा या बंदरांचा उल्लेख आढळतो. या बंदरांवर आलेल्या रोमन जहाजांना तेर, पठण व इतर शहरांतून व्यापारी मार्गाने माल पाठवला जात असे. सार्थवाह हे मालाचे तांडे घेऊन जात असत. या विविध व्यापारी मार्गावर असणाऱ्या डोंगररांगांतील काळ्याकभिन्न कातळात व्यापाऱ्यांनी  दिलेल्या दानामधून लयननिर्मितीला सुरुवात झाली. कुठलेही दान देण्यासाठी दानी माणसाकडे मुबलक प्रमाणात पसा असावा लागतो. तो पसा रोमसोबतच्या व्यापारातून व्यापाऱ्यांकडे आणि मालाला उठाव असल्यामुळे सामान्य माणसाकडेही उपलब्ध होता.

लेणींचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, लेणी बांधली जात नसत तर एकसंध पाषाणात कोरली जात असत. अजिंठा तसेच जुन्नर येथील काही अर्धवट कोरलेल्या चत्यगृहांच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की, ही लेणी कातळाच्या वरच्या बाजूने कोरायला सुरुवात केली जात असे. कारागीर केवळ छिन्नी हातोडय़ाच्या मदतीने ही लेणी कोरत असत. तत्कालीन लाकडी बांधीव स्थापत्याची प्रतिकृती असलेली ही लेणी कोरताना कातळावर स्थपतीने आखलेल्या रेखांकनाप्रमाणे खांब आणि तुळयांच्या जागा सोडून कारागीर इतर भाग कोरत खालच्या भागाकडे येत. त्यानंतर शिल्पकार त्या खांबांना सुबक आकार देऊन त्यावर नक्षी कोरत असत. प्रसिद्ध फ्रेंच मूíतकार रोदां म्हणाला होता की कुठलीही मूर्ती ही दगडात मूळचीच असते; मी फक्त नको असलेला भाग काढून टाकतो. त्याप्रमाणे ही लेणी कोरून काढणाऱ्या भारतीय शिल्पकारांना त्यातील स्थापत्य, मूर्ती, शिलालेखाच्या जागा माहीत असायच्या; इतर नको असलेला भाग ते कोरून काढायचे.




“भारतामध्ये कोरीव लेणींची निर्मिती ही सर्वात प्रथम सम्राट अशोक याच्या काळात झाली.बौद्ध भिक्षूंना हवा असलेला एकांत, ध्यान-धारणा , चिंतन-मनन करण्यासाठी लागणारी शांतता ही नगरात किंवा गावात निवास करुन मिळणारी नव्हती. या साठी त्याने मनुष्यवस्तीपासून दूर अशा डोंगरपरिसरात ही ‘शैलगृहे’ अर्थात ‘लेणी’ खोदविली.

अशोक व त्याचा नातू दशरथ ह्यांनी बौद्ध भिक्खूंसाठी दक्षिण बिहारमधील बाराबर, नागार्जुनी, व सितामढी इ. ठिकाणी ही सुरुवातीची लेणी खोदविली. बाराबर येथे सुदामा, विश्वामित्र, कर्णकौपर, व लोमशऋषी ही चार लेणी आहेत. त्यापैकी ‘सुदामा’ हे लेणे सर्वच प्राचीन असून,’न्यग्रोध गुंफा’ या नावाने ते प्रसिद्ध आहे. याची रचना साधी असून, समोर आयताकार दालन व त्यानंतर वर्तुळाकार खोली आहे.

या लेणींपासून सुमारे १.५ कि मी. अंतरावर ‘नागार्जुनी’ गुहा आहेत. गोपिका, वाडिहक व वडलिक या तीन लेण्यांचा समावेश त्यात आहे. या लेणींचे वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगरातील खडकाला समांतर अशी खोदलेली आहेत. ‘बाराबर’ येथील सुप्रिया व ‘नागार्जुनी’ येथील गोपिका ही लेणी प्रशस्त आहेत.या समूहातील ‘सुदामा’ व ‘लोमशऋषी’ ही लेणी सर्वात प्राचीन असून, ती आकाराने लांबट आयताकार असून त्यातील एका टोकाची रचना ही गजपृष्ठाकार असून ती अर्धगोलाकार आहे.

‘लोमशऋषी’ लेण्याचे प्रवेशद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण असून इतर लेणींहून भिन्न आहे. ते रेखीव असून, अर्धस्तंभांनी युक्त चौरसाकृती द्वार व त्यावर अर्धगोलाकार आकारातील चैत्यकमान कोरलेली असून कमानीच्या वरच्या भागात जाळी कोरलेली असून , त्याखाली स्तूपाला वंदन करणाऱ्या आठ हत्तींचे कलात्मक शिल्पांकन आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प लेणींमधील ‘शैल शिल्पकले’ ची सुरुवात ठरते. ही लेणी अतिशय साधी असून, बौद्ध भिक्खूंच्या समर्पित जीवनाशी या लेणींची जवळीक साधलेली आहे.

मुखदर्शनाचा काही अलंकृत भाग वगळता या लेणीमधील साधेपण नजरेत भरण्यासारखेच आहे. ही लेणी खोदतांना तत्कालीन स्थापत्यविशारदांनी एखाद्या साध्या घरासारख्या ‘आकृतीबंधा’चा उपयोग केला असावा. एखादे घर ज्याप्रमाणे अगोदर लाकडी खांबावर तुळया व छत टाकून उभारण्यात येते, व नंतर भिंतीमध्ये दारे- खिडक्या बसवण्यात येतात, त्याप्रमाणे या ‘लोमशऋषी’ लेणींची प्रारंभीच रचना दिसून येते.

” चारही दिशांकडून आलेल्या भिक्खूंना पावसात राहता यावे, यासाठी ही लेणी खोदविली आहेत…” असे ‘बाराबर’ येथील लेणींच्या भिंतीवर सम्राट अशोक यांचा नातू ‘दशरथ’ याने ‘धम्मलिपी’तील शिलालेखातून लिहून ठेवल्याचे आपणांस आजही स्पष्टपणे दिसून येते….”


सुरूवातीला भिक्खूंना राहण्यासाठी खास सोय नव्हती. सुरूवातीचे भिक्खू रानावनात उघड्यावर किंवा झाडाखाली, डोंगरकपारी, गुहेत वगैरे ठिकाणी राहत असत. मगधच्या बिंबिसार राजाने, “गावापासून फार दूर नाही आणि अगदी जवळही नाही; लोकांना जाण्यायेण्यास सोयिस्कर, पण त्याचबरोबर एकांतवासास योग्य अशा आपल्या राजगृहाजवळील वेळूवन विहाराचे धम्मदान तथागतांना आणि त्यांच्या संघाला केले. संघास मिळालेला हा पहिला विहार.


त्यानंतर अनेक विहार संघास धम्मदान करण्यात आले. तथागतांनी भिक्खुसंघास पाच प्रकारच्या निवासस्थानी राहण्याची सुचना केली होती. ते पाच प्रकार म्हणजे १) विहार २) अध्यायोग (शिखर असलेले मोठे घर) ३) पासाद (मोठे घर) ४) हम्मीय (घराच्या वरच्या माळ्यावरही खोली) आणि ५) गुहा. महाराष्ट्रात हल्ली फक्त ‘लेण्यांच्या स्वरूपात असलेल्या “गुहा” अस्तित्वात आहेत. भिक्खूंच्या निवासस्थानाचे इतर प्रकार महाराष्ट्रातून आता नष्ट झाले आहेत.


बौद्ध शिक्षण पध्दतीत विद्यार्थी शिक्षणासाठी संगारामात जात असे. संगारामात अनेक विद्वान भिक्खू असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होत असे. ‘मागणी तसा पुरवठा’ ह्या तत्त्वानुसार अशा संघारामाचे विश्वविद्यालयात रूपांतर होण्यास बौद्ध शिक्षण पध्दतीत भरपूर वाव असे. म्हणूनच बौद्ध शिक्षण पध्दतीतून नालंदासारखी विश्वविद्यालये निर्माण झाली.


बुद्ध धम्म हा ‘शील, समाधी आणि प्रज्ञा’ यावर आधारलेला धम्म आहे. विद्याव्यासंगाबरोबरच सम्यक समाधीसाठी किंवा ध्यानसाधाणा या लेण्यांचा उपयोग केला जाई. व्यापारी मार्गांवर ज्या ज्या ठिकाणी लेणी खोदण्यास योग्य जागा सापडल्या त्या त्या निसर्गरम्य ठिकाणी एक हजारावर बौद्ध लेणी आहेत. त्यापैकी सर्वसाधारणपणे ७० टक्के लेणी इ. स. ३०० च्या अगोदरची आहेत.


भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायचा झाल्यास बौध्द संस्कृतीचा विचार प्राधान्याने करावा लागतो. तरच प्राचीन इतिहास हा पूर्णत्वास जाईल. प्राचीन बौध्द संस्कृतीच मुळ स्वरूप जे प्रामुख्याने व्यापार, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक या माणवाच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या विषयावर अवलंबून होत. खरतर समाजाचा विकास आणि एकूणच माणवजातीचा विकास या महत्त्वाच्या मूल्यांवर अवलंबून होता. माणसाचा वैयक्तिक आयुष्य आणि तत्कालीन समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी या महत्त्वाच्या मुल्यांच्या विकासावर अधिक भर हा बौध्द संस्कृतीच्या कार्यप्रणालीचा एक भाग होता. त्यामुळे समृध्द बौध्द संस्कृतीचा प्रभाव संपूर्ण आशियाई देशांमध्ये पडलेला आपणास दिसून येतो. मुख्यत्वेकरून सम्राट अशोक व त्यानंतर उदयास आलेल्या राजांच्या राज्यकारभारामार्फत बौध्द संस्कृतीला विषेश चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केल्याचे दिसून येते.

बौध्द संस्कृतीची महत्त्वाची देन म्हणजे पाषाणात कोरलेल्या लेण्या आणि शिल्पकला. याची सुरुवात झाली इ. स. पुर्व तिसर्‍या शतकात सध्याच्या बिहार राज्यातील जहानाबाद जिल्ह्यात बाराबर टेकडीवर पहिली लेणी कोरली आणि इथूनच पाषाणात लेण्या कोरण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळात जवळपास दोन हजार लेण्या कोरल्या गेल्या परंतु महाराष्ट्रात सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये असलेल्या अग्निजण्य खडकामुळे आणि त्या खडकामध्ये असलेल्या विशिष्ट गुणधर्मामुळे नंतरच्या काळात सर्वात जास्त लेण्या या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कोरल्या गेल्या. सह्याद्रीचे नैसर्गिक सौंदर्य आणि बाजूला असलेल्या विस्तृत अरबी समुद्र किनारा या समुद्र किनार्‍यावर व्यापारी बंदरांचा विकास होत गेला. प्रमुख बाजारपेठा आणि व्यापारी बंदर व्यापारी मार्गाने जोडले गेले याच प्राचीन व्यापारी मार्गावर देखण्या लेण्यांचा साज चढवला गेला. इथूनच समतेचा, बंधुतेचा संदेश जगभर प्रसार झाला. ही आहे बौध्द संस्कृतीची व्यापार आणि आर्थिक स्तर उंचावणारी.

या प्राचीन लेण्यांमध्ये शिलालेख कोरले गेले लेण्या कोरण्यासाठी दानकर्ते हे समाजातील प्रत्येक स्तरांतून भरघोस दान देत होते त्यांची सविस्तर माहिती शिलालेखांमुळेच मिळू लागली. त्यामुळे प्राचीन लीपीमध्ये उपलब्ध असलेला शिलालेखाच्या माध्यमातून प्रथमच लिपीची त्यासोबत लिखाणाची ओळख करून दिली ही आहे बौध्द संस्कृतीची देण जी सम्राट अशोकाने भारताला दिली. पाली भाषेतून त्रिपिटकांसारख्या भव्य ग्रथांबरोबरच अनेक बौध्द साहित्याची नंतर निर्मिती झाली हे प्राचीन साहीत्य आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. बौध्द भिक्खू धर्मप्रचारकांनी आपले विचार हे त्यावेळच्या लोकांच्या (पाली) भाषेमध्ये मांडल्यामुळे बौध्द धम्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला व त्यामुळे पालीभाषेचा मोठ्याप्रमाणात विकास झाला.


विज्ञानाच्या सर्व कसोटीवर खरा ठरलेल्या बौध्दधम्माने शिक्षण प्रसारासाठी खूप मोठ योगदान दिलं. ज्ञानदान तक्षशिला हे विद्यापीठ सध्याच्या पाकिस्तान त्या विद्यापीठाचे अवशेष आढळून येतात. त्याच्या उत्खननात आढळून आलेल्या पूराव्यावरून तक्षशिला विद्यापीठाची भव्यता दिसून येते. त्याचबरोबर नालंदा येथे उभारलेल्या विश्वविद्यापिठात त्याकाळात देशविदेशातील जवळजवळ दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते व दोन ते अडीच हजार शिक्षक विद्यादानाच बहुमुल्य काम करत होते. ही आहे बौध्द संस्कृतीची देण जी हजारो वर्षांपासून आपल्याला शिक्षणाच महत्त्व सांगत आहे. मुस्लिम आक्रमकांनी जेव्हा नालंदा विश्वविद्यापिठ जाळल तेंव्हा कित्येक महिने ते जळत होतं कित्येक ग्रंथाची नासधूस केली होती. याच्यावरून नालंदा विश्वविद्यापिठाची भव्यता दिसून येते.


सम्राट अशोकाच्या कालापासून म्हणजे इस पुर्व तीनशे या काळापासून अखंड दगडामध्ये लेण्या कोरण्याच काम सुरू झालं ते इस. एक हजार पर्यंत चालू होतं या कालावधीत अनेक शिल्पकलांचा विकास झाला व त्याचमाध्यमातून प्राचीन बौध्द संस्कृती,कला, सभ्यता, रहाणीमान, व्यापार तत्कालीन स्त्री वर्गाची समाजातील स्थान यांची माहिती मिळत असते. ही आहे बौध्द संस्कृतीची देण. ही शिल्पकलेची भव्यता परदेशातील तसेच देशातील अनेकांना भूरळ घालणारी आहे. कारण या शिल्पकलेचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक आज भारतात येत असतात.


इतर धर्मातील प्रमुख हे स्वतःला देव किंवा प्रेषित समजतात. माणूस संकटात सापडल्यानंतर त्याला देवाकडे प्रार्थना करावी लागते. किंवा मोक्षप्राप्ती, स्वर्गप्राप्तीसाठी धाव घ्यावी लागते पण बुद्धाने हे सर्व नाकारून मी मोक्षदाता नसून मी मार्गदाता आहे हे सांगितले. जे करायचे आहे ते तुम्हालाच करावे लागेल बुद्धाने मानवाच्या मनावर जास्त भर दिला असल्यामुळे स्वर्ग तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करू शकता हे सांगितले कारण जे विचार तुम्ही करता तेव्हा तेच तुम्ही कृतीमध्ये उतरवत असता.


इथे एक गोष्ट सांगाविशी वाटते एकदा एक शिल्पकार दगडामध्ये शिल्प घडवत असतो त्याचवेळी तिथे जवळ असलेल्या एका व्यक्तीने त्या शिल्पकाराला विचारले की तु ही कला कशी आत्मसात केली तेव्हा तो शिल्पकार उत्तर देतो की मी एक शिल्पकार आहे आणि जे शिल्प कोरणार आहे ते या दगडामध्येच आहे मी फक्त त्याच्या भोवती असणारा अनावश्यक भाग आहे तो मी काढणार आहे. बुध्द विचार हेच सांगतो की तुम्ही तुमच्या मनामध्ये असणारा अनावश्यक भाग काढून टाकला पाहिजे तरच तुम्हाला योग्य मार्ग सापडेल.














 हे स्तूप बरेचदा अशा प्रकारे डोंगरातच का असतात? याचा शोध घेतला असता पर्शियातील राजांच्या कबरी अशा प्रकारे दगडातच आहेत. त्याचप्रमाणे लिशियातही असेच दिसून येते.

लिशिया कबरी

पर्शिया कबरी

महत्त्वाचा प्रश्नः
केवळ बौद्ध स्तूपांबाबतीत असा पगडा आहे का? (यवन म्हणजे नक्की कोण होते?)


पिंपळपानाकृती कमान म्हणजे बुद्धाला गयेमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक आहे.
महाराष्ट्रातील स्तूप हे बहुतांशी़ डोंगरात आहेत. त्यांना शैलगृह असेही म्हटले जाते. सांची, सारनाथ, अमरावती(आंध्र) इ. स्तूप हे जमिनीवर आहेत व बांधीव आहेत.
महाराष्ट्रात जमिनीहीवरही स्तूपांचे अवशेष सापडले आहेत. नालासोपारा येथे आजही विटांनी बांधलेल्या स्तूपाचे अवशेष आहेत. पैठण, तेर येथेही बांधीव स्तूप उत्खननात सापडले आहेत.
बौद्ध भिक्खूंनी शांतपणे ध्यानधारणा करता यावी म्हणूनही खोदीव स्तूप डोंगरांमध्ये करण्यात आले.

यवन म्हणजे ग्रीक. तिथल्या आयोनिया प्रांतातून ते आले. त्यांना आयोनियन म्हणायचे, पुढे त्याचे योनिय, योन, यवन अशी रूपे प्रचलित झाली. इथे स्थायिक झालेल्या यवनांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारल्याचे शिलालेखांमुळे दिसून येते.

पिंपळपानाकृती कमान म्हणजे बुद्धाला गयेमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक आहे.

असे मला वाटत नाही, असे मी सांगत आहे! मला (वर दिलेल्या उदाहरणांवरून असे) वाटते की हे आकार पूर्वीपासून प्रचलित होते - ते लिशियातही तसेच होते आणि भारतातही तसेच आले. वरील शैलगृहाचे मुखदर्शन आणि लिशियातील त्या दगडी कबरीच्या मुखदर्शन यात खूप साम्य आहे असे मला वाटते. (हेच एका दुव्यातही दिसते आहे).

आपल्याकडे अमूक गोष्ट हे याचे प्रतिक आहे, तमूक त्याचे असे भरपूर सांगितले जाते. (तुम्हाला म्हणत नाही, पुस्तकांतूनही सांगितलेले दिसते). परंतु नीट पाहिल्यास हे आकार पूर्वीपासून प्रचलित होते असे वाटते.
यावरून मी जालीय अर्धवट संशोधन केले आहे! त्यातून जे काही मिळाले ते लेखस्वरूपात इथे टाकते.

बौद्ध भिक्खूंनी शांतपणे ध्यानधारणा करता यावी म्हणूनही खोदीव स्तूप डोंगरांमध्ये करण्यात आले.
हेही तितकेसे खरे नाही. स्तूप हे बौद्ध अवशेषांवर केले आहेत. त्यांच्याबाजूचे विहार यासाठी नक्कीच आहेत (ध्यान, भिक्खूंची राहण्याची व्यवस्था), पण मूळ स्तूप म्हणजे अवशेषांवर तयार केलेले दगडांचे ढीग होते. ह्यांची काळजी घेण्यासाठी भिक्खूंना विहार केले होते, नंतर अर्थात ती तीर्थस्थाने झाली असावीत (जसे कार्ले).

स्तूपाचे अर्थ असे सर्व दिले आहेतः संदर्भः http://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/cgi-bin/tamil/recherche

a knot or tuft of hair , the upper part of the head , crest , top , summit any relic-shrine or relic-casket (made of various materials , such as terra cotta , clay , elaborately formed brick or carved stone ; often very small and portable , and enclosing a fragment of bone or a hair of some saint or deceased relative , or inscribed with a sacred formula ; these are carried long distances and deposited in hallowed spots such as Buddha-Gaya1) ; any heap , pile , mound , tope. ; the main beam (of a house)

बाकी यवन म्हणजे आयोनिया प्रांतातील हे बरोबर, सध्याचे तुर्कस्तान, लिशिया आणि आयोनिया हे सर्व सारखेच. त्यावरूनही ही पिंपळपानाची रचना नसून यवनी शवपेटिकांवर आधारित रचना आहे असे म्हणणे योग्य ठरेल असे वाटते.

Sunday, June 13, 2021

मराठीत आलेले परकीय भाषेतील शब्द

 मराठीचा सविस्तर इतिहास आपण समजून घेतला.कालौघात महाराष्ट्रावर परकीय सत्तांनी आक्रमण केले आणि इथले सत्ताधीश झाले.त्यांनी आपली संस्कृती आणि भाषा इथल्या जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला.त्यामध्ये ते पुर्णपणे यशस्वी होउ शकले नाहीत कारण हे परकीय सत्ताधारी अल्पसंख्य होते तर बहुसंख्य प्रजा हिंदू व मराठी भाषीक होती.अर्थात हे सत्ताधारी बराच काळ सत्तेत राहील्याचा परिणाम मराठीवर झालाच आणि बरेच परकीय भाषेतील शब्द मराठीमध्ये आले.या लेखामध्ये आपण याच शब्दांचा आढावा घेणार आहोत.

  मूळ मराठी शब्दसंग्रह संस्कृतोद्भव आहे. अगदी प्रारंभापासून त्यात निम्नस्तरीय ऑस्ट्रिक व द्राविड भाषांतील काही शब्दांची भर पडणे अपरिहार्य होते.एखाद्या समाजाचा इतर भाषिक समाजांशी जितका घनिष्ठ संबंध येतो, त्या मानाने इतर भाषांतून घेवाण होणे शक्य असते. मराठी समाज स्थैर्यप्रिय आहे. शिवकालोत्तर मुलुखगिरीचा जमाना सुरू होईपर्यंत इतक्या प्रमाणात इतके मराठी भाषिक बाहेर गेल्याचा पुरावा नाही. यातल्या काही लोकांनी तर लहानमोठ्या प्रमाणात परप्रदेशात (दक्षिणेत व उत्तरेत) वसाहतीही केल्या.

यापूर्वीही दक्षिण व उत्तर यांच्याशी मराठीचा अनेक शतकांपासून संबंध होता, पण तो धार्मिक स्वरूपाचा होता. तीर्थयात्रा व अध्ययन हे त्याचे मूळ हेतू. पण ही प्रवृत्ती इतकी अखंड व मोठ्या प्रमाणावरची होती, की त्याचा भाषेवर व काही सांस्कृतिक तपशिलांवर परिणाम होणे अटळ होते. गोडसे भटजींप्रमाणे जर पूर्वकालीन यात्रेकरून व प्रवासी यांनी स्वतःचे अनुभव लिहिले असते आणि ते आपल्यापर्यंत आले असते, तर बाह्य संपर्काचा भाषेवर पडलेला प्रभाव स्पष्ट झाला असता.

एक गोष्ट मात्र निश्चित. यात्रा, धर्मकार्य, श्राद्ध, सण, व्रते, विवाहादी संस्कार, तिथी, मुहूर्त इ. अनेक कारणांनी धार्मिक वाङ्मयाशी मराठी समाजात सतत संबंध राहिला आणि ही धार्मिक कार्ये करणारे संस्कृतज्ञ असल्यामुळे संस्कृत आवश्यक शब्दांचा परिचय कायम राहिला आणि वापर कधीही बंद पडला नाही.सामान्य व्यवहारात ध्वनिपरिवर्तन होऊन शब्दांची जी नवी प्राकृत रूपे आली त्याबरोबर ही संस्कृत रूपेही अनेक क्षेत्रांत चालू राहिली. शब्द-साद, क्षेत्र-शेत, पत्र-पात, कर्म-काम, दिवस – दीस , रात्र –रात, हस्त – हात, शिक्षण – शिकणे, रक्षण – राखण, पक्षी – पाख (रू), यात्रा – जत्रा, राजा – राव, आज्ञा – आण, ज्ञान – जाण, अशा शेकडो जोड्या तयार झाल्या आणि शब्दच्छटा व्यक्त करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ लागला. मूळ भाषेचे अशा प्रकारे घेतलेले ऋण फ्रेंच भाषेतही दिसून येते. अनेक शतके शिक्षण, न्याय, धर्मकार्य इ. क्षेत्रांत अभिजात लॅटिनच वापरली जात असल्यामुळे तिचा प्रभाव सामान्य जनजीवनावर पडणे ओघानेच आले.

संस्कृतशी असलेले हे सांस्कृतिक नाते भाषिक दृष्ट्या उपकारक ठरले आहे. आजही त्याचे महत्व कमी झालेले नाही. संस्कृतवर होणारी टीका ही तिच्या अतिरेकी व विवेकशून्य वापरामुळे होते. पण नवशब्दनिर्मितीत तिचा वाटा मोलाचा आहे हे नाकारता येणार नाही.

निम्नस्तर, परप्रांतांशी संपर्क आणि संस्कृतचा वारसा ही सर्व स्वाभाविक कारणे झाली. पण काळाच्या ओघात ऐतिहासिक कारणांनी परभाषांशी जो संपर्क घडून आला तो बहुतांशी आक्रमण व संघर्ष या स्वरूपांचा होता. अर्थात मराठीचा संबंध तिच्या प्रारंभानंतरच्या घटनांशीच असणार हे उघड आहे. अशा या घटनांत मुसलमानी आक्रमण, यूरोपातील दर्यावर्दी राष्ट्रांचा आधी व्यापार व नंतर राजकारण यांमुळे घडलेला संपर्क या महत्वाच्या होत.

मुसलमानी सत्तेमुळे तुर्की, फार्सी व अरबी यांचा प्रभाव भारतीय भाषांवर पडला. त्यामुळे राज्यकारभार, सैन्यव्यवस्था इ. विषयांतले शब्द ते आलेच पण पोशाख, राजदरबार, पत्रव्यवहार इ. विषयही त्यातून सुटले नाहीत. मराठीत आज दोनतीन हजार फार्सी-अरबी शब्द आहेत : जमीन, हवा, महसूल, कागद, फौजदार, जिल्हा, तालुका, हुकूम, जबरदस्त, अखेर, खबर, पुलाव, बिर्यानी, दारू, तमाशा, दगा, खून, इसम, सरदार, दाद, बाग इ. शेकडो नित्य व्यवहारातले आणि परिचयाचे शब्द या मार्गाने आलेले आहेत.

पगार, जुगार, चावी, पाव, खमीस, रोटी, काडतूस, पलटण, पाटलूण, पैसा, पिस्तूल, मेज, मिस्त्री इ. अनेक शब्द फ्रेंच-पोर्तुगीजमधले आहेत.

 इंग्रजी शब्दांची मोजदाद करणे कठीण काम आहे. मास्तर, डॉक्टर, स्टेशन, कॉलेज, प्रोफेसर, पेन, पेन्सिल, सायकल, कोट, पँट, ब्लाउज, बूट, इंजीन, मोटार, ड्रायव्हर, टेनिस, क्रिकेट, फूटबॉल, मॅच, आइस्क्रीम, मटण, बिअर, व्हिस्की इ. असंख्य शब्द नित्य वापरातले आहेत, तर सुशिक्षित माणसाचे बोलणे पुष्कळदा इंग्रजी नामांना व क्रियापदांना कर-, हो-यांची रूपे लावून होते, हे दूरदर्शन व आकाशवाणी यांवरील मुलाखती, परिसंवाद, भाषणे यांतून स्पष्ट दिसून येते. मराठीत यांतीन अनेक शब्दांना योग्य प्रतिशब्द असले, तरीही ते वापरले जात नाहीत. त्यामुळे असे शब्द हाही मराठीचाच एक भाग आहे, हे मानावे लागते.

मराठी भाषेत अलिकडे आलेल्या व येत असलेल्या हिंदी शब्दांचे मूळ त्या भाषेला संपर्कभाषा म्हणून प्राप्त झालेल्या स्थानात, त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटांच्या लोकप्रियतेत आहे. हिंदी शब्द येतो तो मराठी शब्दाची जागा घेण्यासाठी. त्यामुळे हे परिवर्तन किंवा प्रवृत्ती ही अनावश्यक मानावी लागते: स्वर्गीय, दर्शक, निर्वाचन, संविधान, स्वास्थ्य यांसारखे अनेक शब्द आता ऐकण्यात येतात.

विनिमयाची पोकळी भरून काढण्यासाठी घेतलेला किंवा तयार केलेला शब्द ही भाषेची गरज आहे. पण पूर्वीपासून असलेले शब्द हुसकावून त्या जागी नवे आणणे अनावश्यक, दुर्बोधता निर्माण करणारे व विनिमयव्यवहाराला घातक आहे. अनेक लेखक स्वतःच्या लहरीनुसार नवनवे शब्द वापरत असतात. सरकारी कारभारासाठी सुचवले गेलेले अनेक शब्दही तसेच आहेत. त्यामुळे पुष्कळदा लोक रूढ व परिचित इंग्रजी शब्दच वापरतात.

या नव्या शब्दांमुळे कोश फुगीर दिसला, तरी भाषिक व्यवहाराच्या दृष्टीने तो केवळ आभास आहे.

फारसी मराठी अनुबंध

 आजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत. आज अगदी घरात असण्याऱ्या वस्तूंची यादी पाहिली तर त्यातले हे सगळे शब्द फारसी आहेत - खुर्ची, मेज, पलंग, तक्त डेग, तबक, समई, शामदान, गुलाबदाणी, अम्बर, जाफरा, ताफा, अत्तर. अश्या या ऐतिहासिक फारसी-मराठी अनुबंधाचा हा धावता आढावा, 

तुर्क,मोगल यांनी इराणवर केलेले आक्रमण,त्यांच्यावर झालेले इराणी संस्कृतीचे संस्कार(फार्सी माषेचा स्वीकार इ.) व त्यांचा भारतात प्रवेश इ. गोष्टी इतिहासात नमूद आहेत. बाराव्या-तेराव्या शतकात त्यांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली व त्याच सुमारास अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या रामदेवराव यादवांवर स्वारी केली, हा इतिहासही प्रसिद्ध आहेच. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा महाराष्ट्राशी निकट संबंध येऊ लागला, मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा फार्सी असल्याने अर्थातच फार्सीचा व मराठीचाही संबंध आला. राज्यकारभारविषयक शिष्ट व्यवहारासाठी फार्सीचा उपयोग होऊ लागला,महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक जीवनही काही अंशी फार्सीमय झाले. मुसलमान राज्यकर्त्याप्रमाणे मराठ्यांनीही इतिहासलेखनास प्रोत्साहन दिले आणि महाराष्ट्रात बखरनवीसांचा, अख्यबारनवीसांचा व पारसनिसांचा एक वर्गच तयार झाला. अगदी एकनाथ महाराजही त्यातून सुटलेले दिसत नाहीत. खालच्या एकनाथी भारुडातले फारसी शब्द पहा:

अर्जदास्त अर्जदार, बंदगी बंदेनवाज, अलेक सलाम साहेबांचे सेवेशी ।
बेंदे शरीराकार जिवाजी शेखदार बुधाजी कारकून परगणे शरीराबाद किल्ले कायापुरी ||

विशेष म्हणजे तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जसा मध्ययुगीन मराठी साहित्याला अरबी-फार्सीचा फ़ारसा स्पर्श होत नाही, तसाच मराठवाड्यातील मराठी भाषेलाही होत नाही. विसाव्या क्रमांकाच्या हातनूरच्या शिलालेखापर्यंतच्या (काल: शके १२२३/ इ.स. १३०१) सर्व शिलालेखांत एकाही अरबी-फार्सी शब्दाचा वापर केला गेल्याचे आढळत नाही, ही मोठी आश्चर्याची बाब होय. ज्ञानेश्वरीत व यादवकालीन महानुभावीय साहित्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके का होईना फार्सी शब्द आढळतात, पण तसे येथे होत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. शके १३२० (इ.स. १३९८) मध्ये सुलतान फेरोजशहाचा या लेखांना स्पर्श होतो पण हे चौदाव्या शतकापर्यंतचे शिलालेख स्वत्वाचे एवढे अभिमानी की 'सुरतान 'व 'पेरोजसाहा 'या दोन फार्सी शब्दाव्यातिरिक्त ते कोणत्याही परकीय शब्दाचा स्वीकार करीत नाहीत. त्यानंतर मात्र फार्सी ही बहमनी राज्यकर्त्यांची राज्यकारभाराची भाषा झाल्याने आपोआपच लोकव्यहारातील मराठी भाषेवर अरबी - फार्सीचा प्रभाव पडणे अपरिहार्य होते. त्यामुळे उत्तरोत्तर मराठीत अरबी - फार्सी शब्दांचा आढळ होतो.

बहमनी,शिवकाल व पेशवेकाल यांतील फार्सी - मराठी अनुबंधाचे स्वरूप पाहता त्यात अनेक स्थित्यंतरे झाल्याचे आढळते. बहमनीकालात फार्सीची मराठीशी विलक्षण जवळीक निर्माण झाली पण तिचे रूपान्तर सावटात होऊ नये अशी चिन्ताही शिवकालात वाटू लागली. राज्यव्यवहारकोशाच्या निर्मितीमुळे मराठीच्या अस्मितेच्या रक्षणाचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला खरा पण पुन्हा पेशवेकालात उत्तर भारताशी व मोगल राजवटीशी संपर्क येऊ लागल्याने फार्सी - मराठीचे संबंध अधिक व्यापक व घनिष्ट झाले.मराठी माणसाच्या जीवनव्यवहाराशी,वाड्मयव्यवहाराशी ,भाषिक व शासकीय व्यवहाराशी असलेला फार्सी भाषेचा हा संबंध उत्तरोत्तर वाढत वाढतच गेला. अव्वल इंग्रजीत व इंग्रजी अमदांनीत,मुसलमानांची राजवट नसतानाही तो टिकून राहिला. एवढेच नव्हे तर इंग्रज हा देश सोडून गेल्यावरही गेले अर्ध शतक हा अनुबंध टिकूनच राहिला.

व्यक्तिनाम हे विशेषनाम असते पण आडनाव हे सामान्यनाम असते. आडनावाचा त्या त्या घराण्याशी संबंध येतो, त्यामुळे फार्सी शब्दयुक्त आडनावांचा मराठी माणसाने केलेला स्वीकार ही त्याच्या जीवनव्यवस्थेतील महत्त्वाची घटना होय, इस्लामी राजवट जाऊन काही शतके लोटली तरी ही आडनावे तशीच कायम आहेत त्यावरून हा प्रभाव किती दूरगामी होता,ते कळते. फार्सी शब्दयुक्त विशेषनामांप्रमाणेच यादवोत्तर कालात महाराष्ट्रात फार्सी शब्दयुक्त हुद्दे रूढ झाले व त्यांचेच पुढे आडनावात रूपान्तर झाले. त्याविषयी व पित्याचे नाव लिहिण्यापूर्वी मुस्लिम पध्दतीप्रमाणे बिन/ विश्न (चा पुत्र) हा अरबी शब्द लावला जाई, त्याविषयीही इतिहासकार वि का राजवाडे यांनी या शब्दांत खंत व्यक्त केली आहे - 'सौदागर, मुश्रीफ,सराफ,चिटणीस,फडणीस पोतनीस ,हेजीबराव,दिवाण,वाकनीस ,वफ्तरदार, वगैरे फारशी आडनावेहि मराठीत रूढ झाली, 'बिन्' ह्या फारशी शब्दानें पिता पुत्रांचा संबंध दाखविण्यापर्यंत ज्या देशातील भटाभिक्षुकांचीही मजल गेली जाऊन पोहोचली, त्या देशांतील भाषेच्या भ्रष्टपणाबद्दल जास्त काय लिंहायचे?'

ही आडनावे किंवा हुद्दा / व्यवसाय दर्शविणारे फार्सी शब्द मुसलमानपूर्व महाराष्ट्रात मुळीच प्रचारात नव्हते, हे मत श्री.वा.कृ.भावे यांनी सप्रमाण नोंदविले आहे.मराठी बखरींत आढळलेली फार्सी शब्दयुक्त आडनावे देत आहे, त्यांतील बरीच आडनावे आजही रूढ असल्याचे दिसून येईल. बखरींतील या आडनावांची संख्याच साठपेक्षा अधिक आहे, त्यावरून हा प्रभाय किती मोठा होता तेही कळेल.

अंकबरनीस (फा. अख्बार नवीस्‌ - बातमीपत्र पाठविणारा)
अमीन (अ. अमीन्‌ = विश्वस्त )'
कानगौ (फा. कानून्गो = वहिषाटीची नोंद ठेवणारा)
कारखानीस (फा. कार्निह-नवीस्‌ कारकून)
कारभारी (फा. कार्बारी नव्यवस्थापक,दिवाण)
*कासीद (फा. कासिंद्‌ = पत्रे पोहोचविणारा दूत)
*किल्लेदार (फा. कलअह -दार्‌ = दुर्गाधिपती, किल्लेकरी)
*कोतवाल (फा.कोत्वाल्‌ किल्लेदार, दारोगा)
खासगीवाले (फा. खासगी, राजाच्या खासगीचा अधिकारी)
खासनीस (फा. खास - नवीस्‌ )
चिटणीस (फा. नवीस ) = पत्रव्यवहार करणारा
*जकाते (अ. ज़ुकात्‌ ) च जकात वसूल करणारा,
*जमादार (फा. टोळीचा / तुकडीचा नायक)
*जहागिरदार (फा. जागीर दार )
ठाणेदार (फा. दार )
*डबीर (फा. दबीर्‌ = लेखक,कारकून,चिटणीस)
*तबीब (अ. तबीब्‌ > वैद्य)
*तोफखाने (तुं. लोप्‌ 4- फा. खानह्‌ )तोफखानेवाला
*दप्तरवार (फा. दफ्लर्‌ दार्‌ कागदपत्रांची काळजी घेणारा अधिकारी)
दफेदार (फा. दफूअदार्‌ रिसाल्यातला लहान, अधिकारी)
*दारुवाला (पारशी जमातीत)(फा. दारू = मद्य)
*दिवाण (फा. दीवान्‌ = प्रधान)
*दिवाणजी (तु. दीवान्‌ ची = प्रधान)
नालबंद (फा. नअलबंद = नाल छोकणारा)
*पागनीस (फा. पाय्‌गाह नवीस्‌ रिसाल्याकडील कारकून )
*पागे (फा.पायूगाह = रिसाल्याचा अधिकारी )
पागेदार (फा. पायूगाह दार्‌ )
*पारसनीस (फा. फार्सीनवीस्‌ = फार्सी पत्रव्यवहार करणारा)
*पेशवे (फा.पेश्वा = पुढारी पंतप्रधान)
पोतदार (फा. पोतहदार्‌ = नाणेपारखी )

*फडणीस (अ. फर्द. = एकेरी पत्र,नवीस्‌ लिहिणारा )

( या फडणीस आडनावासंबंधी थोडी रंजक गोष्ट म्हणजे फडणीस नव्हे फडणवीस पाहीजे हा आग्रह काहीशा शुद्धतेच्या आग्रही अभिनिवेशाने धरला जातो.तेव्हा त्याच्या शब्दाचा मुळांविषयी अनभिज्ञता हे कदाचित एक कारण असावे. )
*फरास (अ. फर्राश = बिछावत घालणारा)

( पुण्यात एक पोलीस चौकी आहे " फरासखाना" नावाने म्हणजे हे पुर्वी काय असणार इथे ? )
बक्षी (फा. बख्शी = सैन्यात पगार वाटणारा)
*बारगीर (फा. बार्गीर्‌ = धन्याने दिलेला घोडा ठेवणारा शिपाई )
*बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी)
बेलदार (फा. बेलदार = खणत्या)
*म॒ (मु) जुमदार (फा, मजुमूअदार्‌ = बसुली कारकून)
*महाले (अ. महल) = महालाचा रक्षक?
"मिराशी (अ. मीशस्‌ ) = मिराशीचा उपभोग घेणारा
*मिरासदार (फा. मीरासीवार्‌)
मिर्धा / धे (फा. दहा शिपायांचा नाईक)
*मोकाशी (मुक्रासा)
*रास्ते (फा.रास्त्‌ )
*वाक(के)नीस (फा. वाकिअ नवीस्‌ = अखबार नवीस्‌ )
*शिकिलकर (फा. सैकल्गर्‌ = हत्यारे साफसूफ करून पाणी देणारा )

("शिकलकरी" या नावाने ओळखला जाणारा समाज  साधारण शिख लोकांसारखे डोक्यावर फेटा बांधतात.)
*शिलेदार (फा. सिलह्दार्‌ = सैन्यातील राऊत)

शेखदार (अ. शेख , फा. दार्‌ )
*सबनीस (फा. स॒फूनवीस्‌ र्‌ सैन्यातील तुकड्यांतील सैनिकांची गणती करणारा )
*सरदार (फा. सरदार : बडा अधिकारी, मनसबदार)
सरंजामी (फा. सरंजामी)
*सरंजामे
*सराफ (अ. सर्राफ़ : सोनेचांदीचा व्यापारी)
*सुभेदार (फा, सूबद्ददार्‌ प्रान्ताधिकारी)
हकीम, हकीमजी (अ, हाकिम्‌ = आज्ञा देणारा अधिकारी)
*हजारी, हजारे (फा. हजारी, हजार सैनिक बाळगण्याची मनसब असलेला)
हरीप, हरीफ (अ. हरीफू) '
*हशमनीम, हसबनीस (फा. हशम्‌नवीस्‌ = हशमाकडील कारकून)
*हधालदार (फा. हवालत्‌ - वार्‌)
*हेजीब (अ. हाजिंब्‌ = वकील)

मुळातले हुद्दे (व्यवसाय व त्यांचे स्वरूप लक्षात यावे, यासाठी येथे मूळ शब्द व त्यांचे डॉ.पटवर्धन यांनी दिलेले अर्थ वरील यादीत नौंदविले आहेत.

*या खुणेने दर्शविलेली आडनावे आजही महाराष्ट्रात प्रचलित आहेत, याशिवाय गुमास्ते (फा.गुमाश्‍तह),दासताने (फा. दास्तान ), पेशकार (फा.पैश्‌ कार),शिकारखाने (फा. शिकार्‌ गानद्),वकील॑ (अ. वकील) अशी कितीतरी आडनावेही आढळतात.

फार्शी लेखक पर्यायवाचक शब्दांचे विशेष चाहते; त्यामुळें कांही शब्दांना प्रतिशब्द अनेक आहेत, ऐक्य व सख्य यास आश्‍नाई, इख्लास, इतलाखी, इंतफाक,
इतह्मद, इरतिंबात, इस्तियाक, एक-दिली, एक-रछ्टगी, एकी, खला-मला, ससूसीयत, तस्फिया, दिल्जमाई, दोस्ती, वसालत, मुस्ताकी, यगानगत वगेरे १८ वर प्रतिशब्द आहेत. वैर-भाण्डण या अर्थी अकस, कर्कैशा, कजिया, किलाफ, खळश, खिसा, जिकीर, जुदाई, दावा, दुस्मनगी, दुही, निफाक, पुर्कश, बर्कशी, असे १४ वर शब्द आहेत. प्रतिष्ठा याअर्थी अज, अस्करा, आब, आबताब, इज्जत, तम्मा, नक्श, नछग, नामोश, वकर, शोहरत, हुर्मत वगैरे १२ वर शब्द आहेत. कौटिल्य या अर्थी कंवाईत, केंद्‌, दुगा, फन्द, फरेब, मकर, हुन्नर, हरिफी, हिक्मत, वगेरे ९ वर शब्द आहेत. संशय या अर्थी अन्देशा, गर्द, गुबार, गुमान, दग्दगा, वस्वास, वहीम, शुक, शूभ वगेरे ९ वर शुब्द आहेत. समाधान या अर्थी खातर, खातरजमा, खातदारी, खातर्दास्त, तक्‍वा, तमानीयत, तशफ्फी, तसली, दिल्दारी, दिल्भरी, दिलासा वगेरे ११ वर शब्द आहेत. पीडा या अर्थी आजार, कसाला, जूबरी, जळाल, जाजती; जुळूम, तश्‍वीस, ताशसि वगैरे शब्द आहेत. शिक्षा या अर्थी तस्बी, नातिजा, नश्यत, शास्त, सजा असे पांच शब्द आहेत. परिश्रम या अर्थी कस्त, कोशीस, मशायत, मेहनत, शिकस्त, सई असे शब्द आहेत. चाल-रिवाज या अर्थी तऱ्हा, तरिका, दस्तूर, पाय-रव, मामूल, रव, रस्म, रवेश, रहा, रिवाज, शिरस्ता, सुदामत असे १२ शब्द आहेत. फार्शीनें मराठींत पर्यायवाचक शब्दांची भर किती आणि कशी केली आहे हें कळायला वरील विवेचन पुरे आहे.

(टीप: या लेखातील बरीच माहिती मी डॉ. यु म पठाण यांच्या 'फारसी मराठी अनुबंध' आणि प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन यांच्या 'फारसी मराठी कोष' यामधून जशीच्या तशी घेतलेली आहे, त्यामुळे माझे श्रेय इथे फक्त संकलकाचे आहे. मूळ संशोधन डॉ पठाण आणि पटवर्धन यांचे आहे.)


*बिनवाला/ली (फा. बीनी = सैन्याची आघाडी) आणि *शिलेदार (फा. सिलह्दार्‌ = सैन्यातील राऊत) हे दोन स्वतंत्र शब्द आहेत याचवरुन बनलेला मराठीत एक खास शब्द वापरला जातो " बिनीचे शिलेदार "

 "रिसाला" याचे रुट रिसालह = घोडदळाची तुकडी असे दिलेले आहे. मराठवाड्यातील जालना शहरात दर रंगपंचमीच्या दिवशी राजा ची रिसाला मिरवणुक निघण्याची परंपरा आहे. म्हणजे राजा बहुधा कधी काळी घोडदळाच्या तुकडी सहीत निघत असावा त्याला तेथे " रिसाला " मिरवणुक असेच म्हटले जाते. तो राजा पुढे गेला की मग रंग खेळणे बंद होते अशी गाव परंपरा आहे.

 याच बरोबर अजुन एक प्रश्न असा पडतो की कारखानीस चिटणीस मुजुमदार फडणीस पोतनीस टिपणीस अशी बरीच नावे " चांद्रसेनीय कायस्थ प्रभु" ची आडनावे आहेत. या समाजाचा सामाजिक इतिहास हा या व्यवसायाच्या नोकरीच्या अंगाने पडताळता येइल का ? म्हणजे मुघलांच्या सेवेत या समाजाचे प्रमाण अधिक असावे का ? कशा स्वरुपाचे असावे ? की आडनावे इथेच या समाजात उचलली गेली इतर समाजातही असे नोकरी करणारे असतीलच पण आडनावे नसतील लावली कदाचित


वि.दा.सावरकरांचा भाषाशुद्धीचा विचार ज्यांना पटला आहे आणि मराठीतून परकीय आक्रमकांनी लादलेल्या शब्दांना कायमचा निरोप मिळायला हवा असे वाटते आहे त्यांच्यासाठी खालील जंत्री देत आहे.

फार्सी,अरबी,पोर्तुगीज आणि तुर्की या भाषांमधून मराठीत आलेले/लादलेले शब्द आणि त्यातल्या काही शब्दांना पर्यायी असे संस्कृतोद्भव किंवा भारतीय भाषांमधले शब्द सुचवले आहेत.आपणही ही जंत्री सुधारण्यास सहाय्य करावे. शब्द सुचवण्यास सहाय्य करावे.

मराठीत सद्या वापरात असलेले फार्सी/अरबी शब्द. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी फार्सी,अरबी शब्दांची मराठीतील अतोनात आवक पाहून भ्रष्टपणाची कमाल झाली असे का म्हटले होते ते खालील जंत्री पाहिल्यावर कळेल.

अर्क - सार
मदत - सहाय्य
उमेद - आशा
खुशाल - आनंदी
तख्त - सिंहासन
दर्यावर्दी - सारंग
दौलत - संपत्ती
फत्ते - यशश्री
बहादुर - लढवय्या
बाजी - भुजा
बाजू - भुजा
शाही - राजसी
हवालदिल -
हालत - अवस्था
हाल - कष्ट
प्यारा - आवडता
खास - विशेष
दारु - मद्य
अस्मान - आकाश
लाल - तांबडा
लष्कर - सैन्य
मुलुख - प्रांत
मैदान - क्रिडांगण
आबाद - समृद्ध
शहर - नगर
घुमट - कळस
पोलाद - लोखंड
बाजार - व्यापारपेठ
बारीक - लहान
बारकाई - सूक्ष्म
बगिचा - उद्यान
हवेली - प्रासादीका
हुबेहूब - तंतोतंत
बरकत - समृद्धी
महाल - प्रासाद
रोषणाई - दिवेशृंगार
इसवी - ख्रिस्ताब्द
अत्तर - सुगंध
अंमलदार - प्रभावक
अर्ज - विनंतीपत्र
कबूतर - पारवा
कलम - छाटणी
कारकून - लिपिक
किल्ला - गड
किल्ली - उकल
कंदील - टांगता दिवा
खासदार -
जिन्नस - सामग्री
दरवाजा - कवाड , द्वार
दौत -
दौरा - संचार
नगारा - डंका
पडदा - आडोसा
प्यादे - हस्तक
बुरुज - मनोरा
मेवा - फळ
शिक्का - ठसा
शिपाई - सैनिक
साहेब - महाशय
खानदान - घराणे
गरीब - दीन , साधाभोळा
जंग - महायुद्ध
सजा - शिक्षा
चाकरी - सेवा
जमात - समूह
जमाव - घोळका
गर्दी - दाटी
ताफा -
गरम - उष्ण
नोकर - सेवक
फौज - सैन्य
बुणगा -
यादी - जंत्री
मालमत्ता - संपत्ती
मोर्चा - आंदोलन
रयत - प्रजा
लवाजमा - थाटमाट
सरंजाम -
अखत्यारी - अधिकारक्षेत्र
मुखत्यार - अधिकार
इज्जत - मान
अब्रू - शील
आजार - रोग
इभ्रत - मान
खात्री - ठाम
खाकी - मृण्मय
खाक - राख
हमी - विश्वास
खातरजमा - आश्वस्त
टंचाई - दुर्भिक्ष
तंगी - चणचण
तहकूब - अनिर्णित
दहशत - गुंडभिती
दावा - न्यायविनंती
धास्ती - भिती
फजिती - हसे
मग्रुरी - घमेंड
मंजुरी - अनुमती
गप्पा -
माफी - क्षमा
हुशारी - तरतरी
खुद्द - स्वत:
जातीने - स्वत:हून
तमाम - सर्व
कंगाल - निर्धन
कफल्लक - दरिद्री
करारी - धीरगंभीर
करामत - चमत्कार
कसब - कौशल्य
कायदा - न्यायनियम
किंमत - मुल्य
खुश - समाधान
जखम - आघात
दगा - घात
दंगा - उपद्रव
दर्दी - रसिक
वारस - उत्तराधिकारी
हिकमती - धाडसी
मातब्बर -
छान - सुंदर
मजला - माळा
मजकूर - उल्लेख
दररोज - दैनंदिन
हप्ता -
निम्मा - अर्धा
जरा - थोडा
वगैरे - इत्यादी
खर्च - व्यय
गंज - क्षति
जोर - बळ
झाडू - केरसुणी
डाग - कलंक
तपास - शोध
ताव - ताप
नक्कल - प्रती
पेहराव - वेषभूषा
फितूर -
बदल -
बदनामी - निंदा
बहर - शोभा
बनवणे - निर्माण
बिछाना - अंथरुण
मुरांबा - मुरवणी
शरम - लाज
सतावणे - त्रास देणे
नरम - मऊ
लंगडा - दिव्यांग
सर्दी - पडसे
सुस्ती - आळस
अजमावणे - क्षमतामापन
गुदरणे - गुन्हारोपण
छाप - मुद्रण
फर्मावणे - सुनावणे
बजावणे - निक्षून सांगणे
शिलगावणे - पेटवणे
गमावणे - हरवणे
जमा - साठा
दम - श्वास
गर्क - मग्न
तरबेज - निपुण
फितवणे - गंडवणे
फिदा - आसक्त
दखल - नोंद
माहिती - ज्ञात
गैर - चुकीचा
ते(उदा. पुणे ते ठाणे)
देखील - सुद्धा
नजीक - जवळ
बद्दल - संबंधी
बेलाशक - नि:संशय
बेकारी - निष्कामी
बेगुमान - नि:संदेह
बेअब्रु - अवमानित
बेजार - त्रासणे
हैराण - वैतागणे
बेदिक्कत - विनाअडथळा
बेपर्वा - काळजीहीन
बेफिकीर - चिंताविहीन
बेरोजगार - उपजीविकाविहीन
बेचिराख - सर्वनाश
बेलगाम - निरंकुश
बेहद्द - असीम
खूप - अत्याधिक
बिचारा - दीन
बादशहा - सम्राट
बेघर - अनिकेत
बेसावध - अनवधान
बेहिशोबी - अगणित
माफक - प्रमाणात
मार्फत - द्वारा
लाचार - निरुपाय
लाजवाब - निरुत्तर
शिवाय - विना
अखेर - शेवटी
ऐवजी - च्यास्थानी
खेरीज - टाळून
हद्द - सीमा
दाखल - प्रवेशता
बाबत - संबंधी
लायक - पात्र
सलामत - सुरक्षित
मजल दरमजल -
बरोबर - योग्य
सवाई - श्रेष्ठ
बेशक - नि:संशय
जिंदाबाद - अमर
मुर्दाबाद - धिक्कार
शहीद - हुतात्मा
हैदोस - धुडगूस
हाय - काळजी
बिलकुल - मुळीच
बेहत्तर - श्रेष्ठ
बेजार - दुर्मुख
शिताफी - वेगाने
अलाहिदा - वेगळा
यंदा - या काळात
अखेर - अंतिम
अजिबात - मुळीच
अजून - अधिक
दुतर्फा - द्विभुजा
एकाएकी - आकस्मिक
अचानक - नकळत
जलद - वेगवान
हल्ली - याकाळी
ऐषआराम - विलास
ऊद - धूप
वस्ताद - शिक्षक
चष्मा - उपनेत्र
ऐन - योग्य
दरसाल - नित्यवर्ष
अलबत - साहजिक
निखालस - पूर्णपणे
साफ - स्वच्छ
जरुर - अवश्य
हमखास - निश्चित
फाजील - अति
दुय्यम - हलका
हकनाक - अकारण
अदब - आदर
डौल - नखरा
तोरा - थाट
हल्ला - आघात
हवा - वारा
हवाली - सोपवणे
हराम - नीच
हरकत - अडथळा
हलाहल - भयंकर विष
हलवा - सांजा
जालीम - तीव्र
सल्ला - मार्गदर्शन
निशाणी - खूण
तैनात - सज्ज
अवलिया - चमत्कारीक
सफर - प्रवास
कवायत - नियमावली
कमाल - वरचा
असामी - व्यक्ती
मर्द - पुरुष
कसोशी - निगुतीने
किताब - सन्मान
खुमारी - स्वाद
तफावत - तूट
ला (द्वितीया विभक्ती)
ताकीद - निक्षून
नेस्तनाबूत - मोडकळीस
शिक्कामोर्तब - निश्चिती
जिकीर - त्वेष
जिगरी - जीवाभावाचा
जुलूम - अन्याय
फिर्याद - दोषारोप
फडतूस - निम्न
तजवीज - सज्जता
तरतूद - सज्जता
हव्यास - लोभ
दुवा - आशिर्वाद
आरास - सुशोभिकरण
कैफियत - खंत
तक्रार - वाद
तगादा - धसा
हरकत - आक्षेप
गाशा - अंथरुण
मेण -
सराई - सोहळा
तसबीर - प्रतिमा
मस्ती - उन्माद
रोजनिशी - दैनंदिनी
अमानत - ठेव
मुद्दाम - ठरवून
कारस्थान - कट
चलाखी - धूर्तपणा
पालखी -
हलाखी - दरिद्री
चिलखत -
मुलाखत - अोळख
रोख -
झबले - अंगडे
गहजब - गोंधळ
तह - ठराव
दुही - वितुष्ट
शहारा -
इशारा - संकेत
काफिला - गट
दर्जा - श्रेणी
परागंदा - पलायन
गायब - अदृश्य
मामला - घटना
मुडदा - प्रेत
दागिना - अलंकार
कत्तल - रक्तपात
जिद्द - त्वेष
टप्पा - पायरी
शिल्लक - उर्वरित
रद्द - स्थगित
हक्क - अधिकार
तालुका -
झूल -
मुलामा - वर्ख
मुदत - कालमर्यादा
तुरा -
तयारी - सज्जता
चीजवस्तू - वस्तू
तपशील - वर्णन
खरिप -
कबूल - मान्य
शेरा - मत
ताशेरा - परखड मत
गुजराण - उपजीविका
सलोखा - मैत्री
फुरसत - सवड
वसूल -
दुनिया - जग
मोबदला - मानधन
मोहीम - युद्धयोजना
दूर - लांब
अफलातून -
शक्कल - युक्ती
अजब - विचित्र
मजबूत - दणकट
शाबूत - शिल्लक
जेरबंद - पकड
जेरी - शरण
देणगी - दान
पेच - अडचण
मेज - चौरंग
कैद - बंधन
सैतान - दैत्य
दोस्त - मित्र
शिरजोर - वरचढ
मौज - आनंद
इलाज - उपाय
कुर्ता - सदरा
रजई - दुपटे
शिकार - भक्ष्य
कमकुमवत - क्षीण
गुन्हा - दोष
जबरदस्त - स्तिमित
तीरंदाज - धनुर्धारी
गोलंदाज -
दस्तावेज - ठरावपत्र
दप्तर - कचेरी
मुलाहिजा - मानसन्मान
मौजे -
मयत - मृत
गलबत - महाजलयान
जहाज - जलयान
ताकद - शक्ती
तालेवार -
बडतर्फ - निष्कासित
फारकत - दुरावा
दालन - अंत:पुर
डेरा - मठ
रहदारी - आवकजावक
मजूर - कष्टकरी
कारकिर्द - कार्यकाळ
नफा - वित्तलाभ
फायदा - लाभ
नुकसान - तोटा
नाजूक -
नालस्ती - निंदा
रवानगी - पाठवणी
सनद - पदवी
जवान - तरुण
गुलाम - बंधक
दुकान - विकान
तावदान -
पेशा - व्यवसाय
फलाणा -
सफेद - पांढरा
सफाई - स्वच्छता
बर्फ -
शिफारस -
वाकबगार - निष्णात
मुदपाकखाना - स्वयंपाकघर
काबीज - प्राप्त
आबाद - जिवंत
ताबा - नियंत्रण
कब्जा -
सुमारे - साधारणत:
अंदाज - अनुमान
सुमार - हलका
सुरु - आरंभ
छानछोकी - श्रीमंती
शिकस्त - पराकाष्ठा
फर्मास - उत्कृष्ट
मशाल - दिवटा
मश्गुल - निमग्न
फरशी - भुमी
बेसुमार - अनियंत्रित
शिलेदार -
शिरपेच -
मोसम - ऋतू
पसंत - आवड
किस्सा - घटना
नशीब - भाग्य
हिंमत - धैर्य
हंगाम -
कित्ता -
ताजा - नवीन
सामान - वस्तू
हकीकत - कथानक
सरकार - शासन
शाहीर -
रियाज - सराव
शाई -
अबकारी -
जरतारी -
अब्रू - मान
जाब - कारण
कारभार - कार्यभार
खुलासा - स्पष्टीकरण
दरबार - राजसभा
पोशाख - वेष
कामगार - कार्यकर्ता
गुन्हेगार - दोषी
दिरंगाई - विलंब
खाना - आलय
पैदास - निर्मिती
बाग - वाटिका
महिना - मास
रसद - शिधा
हजार - सहस्र
सबब - कारण
की -
खबरदार - सावध
खाशी - चांगली
लष्कर - सेना
स्वार - आरोही
तंबू -
शामियाना -
लगाम - मर्यादा
मेख - खुंटी
मुदत - अवधी
मेहरबानी - कृपा
खंदक - खळगा
खलास - मुक्त
इमारत - भवन
पगडी -
मखमली -
चादर - पांघरुण
अक्कल - बुद्धी
डावपेच - सापळा
जबरी - दणका
नेकी - प्रामाणिकपणा
हमाली - श्रमिक
फौजदार - सेनाधिकारी
मच्छरदाणी - डासदाणी
नखरेबाज -
दगलबाज - घातकी
दवाखाना - रुग्णालय
कारखाना - कर्मशाळा
दुश्मन - शत्रू
बंदोबस्त - नियंत्रण
जमीनदोस्त - भुईसपाट
कंगोरा -
पाया -
चौथरा -
गिलावा -
इमला - भवन
जिना - दादर
गच्ची - छत
तलाव - सरोवर
फवारा - कारंजा
अस्तर -
खिसा -
गादी -
रुखवत - पाठवणी
आर्जव - याचना
ऐपत - क्षमता
चूप - शांत
चोप - मर्दन
कारवाई - कृती
तब्येत - प्रकृती
जबाबदारी - उत्तरदायित्व
तल्लफ -
मुजरा - नमन
कायम -
जिरायत - पीकशेती
बागायत - उद्यानशेती
फायदा - लाभ
विलायत - परदेश
वायदा - भावनिश्चिती
मायना -
जहाँबाज -
जहागीर -
कहर - अतिरेक
तह - ठराव
हयात - जिवंत
पायमल्ली -
अदमास - अटकळ
अबकारी -
आवाज - ध्वनी
पुलाव -
हशील - प्राप्ती
अशील -
तेजी - चढा
तारीख - दिनांक
जखम - आघात
जमीन - धरा
जाहीर - स्पष्ट
जवाहीर -
काहिली - व्याकूळ
जादा - वाढीव
जास्त - अधिक
शास्ता - शासक
कज्जा - वाद
चेहरा - मुखचर्या
मेहनत - श्रम
इमान - स्थितप्रज्ञता
मेहेरबानी - कृपा
खजिना - धनसंपत्ती
सोबत - सह
दुबार - दोनदा
नमुना - प्रतिकृती
सुभा -
जिल्हा -
कदर - कौतुक
जरब - धाक
फर्मान - राजाज्ञा
उरूस -
कुलूप - खोडा
फिकीर - चिंता
जबरदस्ती - मनमानी
इलाखा - प्रांत
हुकूम - निर्देश
गस्त -
फस्त - प्रोक्षण
मस्त - आल्हादक
वक्तशीर -
खुर्द -
बुद्रुक -
जर्द - दाट
दर्द - वेदना
फक्त - केवळ
दलाल - अडते
सराफ - सुवर्णकार
कुवत - क्षमता
गुलछबू - विलासी
मनुका - सुके द्राक्ष
मयत - मृत्यू
अद्दल -
अंमल - प्रभाव
अस्सल - खरा
रक्कम -
मुक्काम - थांबा
मुकाबला - सामना
नक्की - निश्चित
सद्दी - काळ
रब्बी -
जनावर - प्राणी
तोशीस - सुगावा
पत्ता - रहिवास
कुस्ती - मल्लयुद्ध
शिरस्ता - सवय
बक्षीस - पारितोषिक
शाबासकी - कौतूक
मिश्कील -
खलाशी - सारंग
अफवा - कंडी
जागा - स्थान
तंबी -
तऱ्हा - पद्धत
सबुरी - संयम
कारागीर -
शिस्त - नियम
खुशाल - आनंदी
हालहवाल - परिस्थिती
चकमक -
खबरबात - वृत्त
मस्करी - चेष्टा
रंग - वर्ण
रिवाज - परंपरा
वाकबगार - निपुण
बेबंद - मनमानी
बेमुर्वत - कृतघ्न
नकाशा - रचना
नियत - हेतू
रस्ता - पथ
बाकी - शिल्लक
मशागत - जोपासना
रुबाब - थाट
बेमालूम - अनभिज्ञ
बरबाद - उध्वस्त
कमनशिबी - अभागी
बदमाश - धटींगण
बेकारी -
बेदम -
जप्त -
जमा - साठवण
वजाबाकी - घट
बेरीज - वाढ
मोफत - विनामूल्य
बातम्या - वृत्तांत
दरम्यान - मध्यंतर
हुद्दा - पद
घड्याळ - वेळदर्शक
पैदा - जन्म
मेजवानी - भोजनातिथ्य
दाद - प्रतिसाद
दुरुस्त - सुधार
हजेरी - उपस्थिती
मालक - स्वामी , धनी
बेचैन -
खुर्ची -
पलंग -
तबक -
समई -
अगरबत्ती -

मराठीतले पोर्तुगीज शब्द

पगार - वेतन
बिजागरी -
कोबी -
हापूस -
फणस -
घमेले -
पायरी -
लोणचे -
तुरुंग - बंधकगृह
तिजोरी -
काडतूस -

मराठी भाषेत आलेले तुर्की शब्द

कजाग
चपाती

फार्सी/अरबी शब्दांनी बनलेली मराठी लोकांची आडनावे या आडनावांना निरोप कसा द्यावा बरे? :)

जमेनीस - ( जमीनीचा हिशोब ठेवणारा)
म ( मु ) जुमदार ( फा , मजमूअदार = वसुली कारकून ) महाले ( अ . महल ) = महालाचा रक्षक
मिराशी ( अ . मीरास् ) = मिराशीचा उपभोग घेणारा मिरासदार ( फा . मीरासीदार )
मिर्धा | र्धे ( फा , मीर्दह = दहा शिपायांचा नाईक )
मोकाशी ( मुकासा - गावइनाम )
रास्ते ( फा रास्त )
वाक ( के ) नीस ( फा . वाकिअ नवीस् = अखबार नवीस् )
शिकलगार ( फा . सैकल्गर = हत्यारे साफसूफ करून पाणी देणारा )
शिलेदार ( फा . सिलदार = सैन्यातील राऊत )
शेखदार ( अ . शेख , फा . दार )
सबनीस ( फा सफ़नवीस् = सैन्यातील तुकड्यांतील सैनिकांची गणती करणारा )
सरदार ( फा , सर्दार : बडा अधिकारी , मनसबदार ) सरंजामे ( फा . सरंजामी )
सराफ ( अ . सर्राफ : सोनेचांदीचा व्यापारी )
सुभेदार ( फा . सुबहदार् = प्रान्ताधिकारी )
हजारी , हजारे ( फा . हज़ारी = हजार सैनिक बाळगण्याची मनसब असलेला )
हरीप , हरीफ ( अ . हरी )
हसबनीस ( फा . हशम्नवीस् = हशमाकडील कारकून ) हवालदार ( फा . हवालत् - दार )
हेजीब ( अ . हाजिब = वकील )
गुमास्ते ( फा गुमाश्तह )
दास्ताने ( फा . दास्तान )
पेशकार ( फा पेश् कार )
शिकारखाने ( फा . शिकार ख़ानह )
वकील ( अ . वकील )
कानगो ( फा . कानून्गो = वहिवाटीची नोंद ठेवणारा ) कारखानीस ( फा , कानिह - नवीस् = उद्योगशाळेतील कारकून )
कारभारी ( फा . कार्वारी = व्यवस्थापक , दिवाण ) " काशीद ( फा . कासिद् = पत्रे पोहोचविणारा दूत ) ' किल्लेदार ( फा , कलअह -दार् = दुर्गाधिपती , किल्लेकरी )
कोतवाल ( फा.कोत्वाल -किल्लेदार )
खासगीवाले ( फा . खास गी + वाला = राजाच्या खासगीचा अधिकारी )
खासनीस ( फा , खास - नवीस् ) '
चिटणीस ( फा . नवीस् ) = पत्रव्यवहार करणारा . ' जकाते ( अ . जकात् ) = जकात वसूल करणारा . ' जमादार ( फा . जम्झदार् = टोळीचा / तुकडीचा नायक ) जहागिरदार ( फा . जागीर् दार )
डबीर ( फा , दबीर् = लेखक , कारकून , चिटणीस ) ' तबीब ( अ . तबीब् = वैद्य )
तोफखाने ( तु . तोप् + फा . खानह ) तोफखानेवाला ) दप्तरदार ( फा . दफ्तर् दार् = कागदपत्रांची काळजी घेणारा अधिकारी )
दफेदार ( फा . दफ्अदार् = रिसाल्यातला लहान अधिकारी ) '
दिवाण ( फा . दीवान् = प्रधान ) ' दिवाणजी ( तु . दीवान् ची = प्रधान )
नालबंद ( फा , नालबंद = नाल ठोकणारा )
पागनीस ( फा . पायगाह नवीस् = रिसाल्याकडील कारकून )
पागे ( फा पायगाह् = रिसाल्याचा अधिकारी ) पागेदार ( फा . पायगाह दार )
पारसनीस ( फा . फार्सीनवीस् = फार्सी पत्रव्यवहार करणारा )
पेशवे ( फा. पेश्वा = पुढारी , पंतप्रधान )
पोतदार ( फा . पोतदार = नाणेपारखी )
फडणीस ( अ . फ़र्द , = एकेरी पत्र , नवीस् लिहिणारा ) फरास ( अ . फर्राश् = बिछायत घालणारा )
नाक्षी ( फा . बख़्शी = सैन्यात पगार वाटणारा )
बारगीर ( फा . बार्गीर् = धन्याने दिलेला घोडा ठेवणारा शिपाई )
बिनवाला / ली ( फा , बीनी = सैन्याची आघाडी )
बेलदार ( फा , बेलदार = खणत्या )

फार्सी व अरबी शब्दांनी घडलेल्या आडनावांची जंत्री फार्सी मराठी अनुबंध या यु.म.पठाण यांच्या पुस्तकातून साभार

इंग्रजीतून मराठीत आलेले काही शब्द आणि त्यांना समानार्थी असे मराठी शब्द मराठीत आधीच उपलब्ध असलेले शब्द.(ज्या वस्तू/संकल्पना पाश्चात्त्यांनी शोधल्या आहेत त्यांची नावे इंग्रजीच वापरणे योग्य असल्याने ते शब्द टाळले आहेत.)

थँक यू
फ्लोअर
ब्रेकींग न्यूज
फाऊंडेशन
सॉरी
एक्सक्युज मी
ऑक्सिजन
ब्रश
बर्नर
कॅन्सल
पोझिशन
लुक
क्यूट
पार्टीशन
पार्टी
ट्रॅफिक
हॉस्पिटल
स्पीड
केबिन
टब
सेफ
डायरेक्ट
प्रॉब्लेम
शॉप
अॅव्हरेज
कॉस्ट
इंटरेस्टींग
हायब्रिड
परमिशन
ओपन
क्लोज
रुम
मशिन
स्टाफ
बेल्ट
डिझाईन
मिडीया
सोशल
व्हेरिफिकेशन
पॅनिक
बेसिकली
सिस्टीम
अॅक्सीडंट
युजर
मेसेज
सपोर्ट
ग्लास
प्रॉडक्शन
सुपरवायझर
टायमिंग
कॉम्प्लिकेटेड
क्युरिअॉसिटी
फास्ट
स्लो
कार्पेट
कॅज्युअल
टाईमपास
टेंपररी
पर्मनंट
पर्फेक्ट
पर्फ्यूम
मॅनेज
इंटरव्ह्यू
इंडस्ट्री
ग्रुप
लॉक
बाथरुम
डिपार्टमेंट


मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे.

तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता. दिनु , घनु ,वेलु असे उकारान्त शब्द भरपूर आहेत. काही वेळा क्रियापदेदेखील उकारान्त आली आहेत. आपण बर्‍याचदा बोली मराठीला लिखित स्वरुपात दर्शवताना क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरावर जोर दर्शवण्यासाठी त्यावर टिंब देतो(अनुस्वार नव्हे) उदा. होते~होतं , घडते~घडतं इ. ही टिंब दिलेली अक्षरे मुळची उकारान्त आहेत. म्हणजे होतु , घडतु अशी. हा तेलुगूचा प्रभाव. नंतर हा उकार गळून फक्त जोर राहिला.
तेलुगूमधले एक संबोधन 'गारु' जसे की अण्णय्यागारु , सीतारामय्यागारु इ. हे मराठीत पूर्वी ग्रामीण भागात प्रचलित होते. जसे की 'काय गा काय म्हंतोस?' 'कुटं गा निगालास?' यातला गा हा गारुचा प्रभाव आहे.
नाल , टाळे , तूप , गदारोळ , जाडी , शिकेकाई , अनारसा , गजगा , ताळा हे शब्द तेलुगूमधून मराठीत आले आहेत.

इ.स. १३०० मधे तेलुगू भाषेत 'पंडिताराध्य चरित्र' या नावाचा ग्रंथ लिहिलेला आढळतो. या ग्रंथात काही मराठी गाणी आहेत.

पेशव्यांच्या काळात बरेचसे ब्राह्मण हे सैन्य , राज्यकारभार इथे कामी आले. त्यामुळे मंदिरांतील पुजाअर्चा, होमहवन,पौरोहित्यासाठी ब्राह्मण कमी पडू लागले. त्यामुळे तेलंगणमधून बरेचसे ब्राह्मण महाराष्ट्रात आणावे लागले किंवा आले. तेलंग , वर्तक अशा आडनावांचे ब्राह्मण मुळचे तेलुगूभाषिक पण महाराष्ट्रात आल्यानंतर ते मराठी देशस्थ ब्राह्मणांमधे सामावून गेले. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे मुख्य पुजारी मुनीश्वर हे सुद्धा मुळचे तेलंगणातीलच. साधारण ७०० वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रात आले.
सोलापूर हा महाराष्ट्रातील तेलुगू लोक भरपूर संख्येने असणारा जिल्हा. तेलुगूभाषिक विणकर पद्मशाली समाज महाराष्ट्रात परिचित आहे. हे लोक घरात तेलुगू तर बाहेर मराठीत बोलतात.



भाषाभाषांतील देवघेव आणि भाषासमृद्धी ह्या विषयावर अनेकांनी एका रूढ असलेल्या समजाचा पुनरुच्चार केला आहे. तो म्हणजे इतर भाषांतील शब्द स्वीकारल्याने भाषा समृद्ध होते. मला हा समज पूर्णपणे पटत नाही. भाषेची समृद्धी आपण कशी मोजतो हा खरा प्रश्न आहे.

त्यातला सर्वात सोपा मार्ग म्हणजे भाषेतील (संकल्पनांचे वैविध्य दाखवाऱ्या) शब्दांची संख्या पाहणे (समान संकल्पना असणारे शब्द तात्पुरते वगळून). ह्या दृष्टीने विचार केला तर इतर भाषांतल्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते हे खरे आहे. पण त्यासाठी इतर भाषांतून शब्द घेणे अटळ नाही. कारण माझ्या भाषेत तितक्या संकल्पना व्यक्त करणारे शब्द मी घडवू शकलो तरी भाषा समृद्ध होणारच असते.

भाषेची समृद्धी दुसऱ्या प्रकारेही मोजता येईल. मला ही समृद्धी अधिक महत्त्वाची वाटते. एखादी भाषा मानवी जीवनातील किती प्रकारच्या व्यवहारांत वापरण्यात येते हे पाहता येईल. अशा व्यवहाराची परंपरा त्या भाषेत किती प्रमाणात रुजली आहे ह्यानुसार तिची समृद्धी जोखता येईल. अशा तऱ्हेच्या समृद्धीत इतर भाषांतून येणारे शब्द काही वाटा उचलू शकतील. पण तेही अनिवार्य नाही. इथेही मी त्या शब्दांऐवजी स्वतःच्या भाषेत नव्या संज्ञा घडवल्या तर समृद्धी उणावणार नसतेच. थोडक्यात भाषेची समृद्धी आणि शब्दांची देवघेव ह्यांचा तर्कदृष्ट्या अनिवार्य संबंध नाही. त्यामुळे
भाषासमृद्धीसाठी इतर भाषांतून शब्द घ्यायलाच हवेत असे नाही.

इंग्रजी भाषेने इतर भाषांतून शब्द घेतले आहेत ह्याचा त्या भाषेच्या समृद्धीशी संबंध जोडता येणार नाही. इंग्रजी भाषा समृद्ध आहे. कारण त्या भाषेला विविध जीवनक्षेत्रांतील व्यवहाराची मोठी परंपरा आहे. इंग्रजी भाषकांचे राजकीय वर्चस्व, त्यांची ज्ञानलालसा, ह्या दोहोंतून उभ्या राहिलेल्या ज्ञानव्यवहार आणि इतर व्यवहार ह्यांच्या व्यवस्था ही त्या परंपरेची कारणे आहेत. इंग्रजी ही केवळ इंग्रजांनी दुसऱ्या भाषांतून शब्द घेतले म्हणून समृद्ध झाली नाही. तसे म्हणणे हा काकतालीय न्याय झाला. त्यांनी जगभरातले ज्ञान आपल्या भाषेत आणले आणि नव्या ज्ञानाच्या परंपरा आपल्या भाषेतून आरंभल्या. 'इतर भाषांतले शब्द घेतले म्हणून इंग्रजी समृद्ध झाली' असा संबंध नसून 'इंग्रजी भाषा समृद्ध झाली आणि तिने इतर भाषांतले शब्दही स्वीकारले' असा संबंध आहे. विविध भाषकांचा संबंध आल्याने त्यांच्या भाषांतील शब्दांचीही देवघेव होत असते. ते साहजिक आहे. पण तिचा समृद्धीशी कारण म्हणून संबंध जोडणे हे योग्य नाही. तात्पर्य इतर भाषांतील शब्द घेतल्याने भाषा समृद्ध होते ही कारणमीमांसा मला मान्य नसल्याने इतर भाषांतून शब्द घेतल्याने इंग्रजी समृद्ध झाली हेही मला मान्य नाही. त्यामुळे तशा प्रकारची तथाकथित समृद्धी ही प्रशंसनीय वा निंद्य वाटण्याचे कारणच नाही.

इतर भाषांतले शब्द घेणे हे समृद्धीचे कारण नसले तरी तसे घेण्यात सोय आहे की नाही? सोय आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषतः आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे. नव्या ज्ञानाची निर्मिती, मांडणी आपल्याकडे आपल्या भाषांतून क्वचितच होते. त्यामुळे एखाद्या नव्या ज्ञानाची ओळख आपल्याला इंग्रजीद्वारे होते. त्यासंदर्भातील संकल्पना आपण इंग्रजी संज्ञा वापरूनच शिकतो. त्या संकल्पनांसंबंधीचा व्यवहारही मुख्यत्वे इंग्रजी भाषेतून किंवा इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरून होत असतो. मराठीत आपण जो व्यवहार करणार तो बऱ्याचदा फक्त उपयोजनात्मक असतो. अशा वेळी मराठीत वेगळी संज्ञा तयार करणे, तिचा संकेत रूढ करण्याचा प्रयत्न करणे ही कामे अधिक कष्टाची आहेत हे खरे आहे. त्यातून आपला उद्देश हा केवळ आकलन होणे इतकाच असेल तर नव्या संज्ञेपेक्षा परिचित अशी जुनीच संज्ञा अधिक सोयीची.

वरील युक्तिवाद नक्कीच प्रभावी आहे. पण तरीही मला तो स्वीकारावासा वाटत नाही. एक तर केवळ सोय हा मुद्दा नेहमीच विवेकी असेल असे नाही. सर्वांनीच आपापल्या भाषा सोडून इंग्रजीतच व्यवहार करणे हे अधिक सोयीचे आहे असेही कुणी पटवून देऊ शकेल. असे सांगणारे लोक मला भेटले आहेत. दुसरे म्हणजे मराठी संज्ञा घडवणे हेच मला अधिक सोयीचे वाटते. ह्याची कारणे दोन आहेत. १. राजकीय बलाबलाचा मुद्दा २. बौद्धिक आनंदाचा मुद्दा

मी इंग्रजीतील कोणतीही संज्ञा मराठीत वापरू नये अशा मताचा नाही. पण इंग्रजीतून कमीत कमी संज्ञा स्वीकाराव्या अशा मताचा नक्कीच आहे. ह्याचे कारण इंग्रजी आणि मराठी ह्या भाषांचे सामाजिक-राजकीय बलाबल. इंग्रजी आणि मराठी ह्यांचा संबंध आपापल्या स्थानी राहून समृद्ध होणे आणि देवघेव करीत राहणे इतकाच नाही. तर किती जीवनक्षेत्रांतील व्यवहारांत कुणी टिकून राहावे असा आहे. उद्या मराठी भाषकांची भाषा बदलली तर ती कोणती भाषा होण्याची शक्यता अधिक आहे? तर ती भाषा इंग्रजी असेल हे उघड आहे. मराठी भाषकांनी इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे केवळ आपली सोय पाहणे इतकाच अर्थ नाही. तर ह्या व्यवहारात मराठी शब्द वापरणे शक्य नाही असे मान्य करणेही आहे. मराठीचे वापरक्षेत्र उणावून इंग्रजीचे वापरक्षेत्र वाढवणे असाही आहे.

पण इंग्रजी संज्ञा नाकारून नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल असे थोडेच आहे? नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल हे काही शक्य वाटत नाही. पण तसे करून मराठीचे वेगळेपण आणि स्पर्धेत असणे अधिरेखित होईल. एखादी गोष्ट टिकून राहण्यासाठी पहिल्यांदा तिचे वेगळे अस्तित्व टिकून राहावे लागते. मराठी जिंकेल की नाही हे शेवटी बलाबलानेच ठरेल.

दुसरा मुद्दा असा आहे की नवीन संज्ञा घडवणे आणि तिचा संकेत रूढ करणे हे कष्टाचे असले तरी आनंद देणारे काम आहे असे मला वाटते. नवीन संज्ञा घडवताना त्या संकल्पनेचा परिचय अधिक दृढ होतो. संलग्न संकल्पना अधिक नेमकेपणे उमगून येतात. आपण संकल्पनांच्या अधिक जवळ जातो. आपल्या भाषेचे सामर्थ्य तिच्या मर्यादा ह्यांची जाण प्रगल्भ होते. अर्थात घडवलेली प्रत्येकच संज्ञा अशी असते असे म्हणणे नाही. पण ह्या प्रक्रियेबद्दल आस्था असणारांचा असा अनुभव आहे. ह्या कारणांमुळे मला नव्या संज्ञा घडवण्याचा मार्ग अधिक योग्य वाटतो.

संज्ञा घडवणे आणि ती रूढ होणे/ करणे ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. संज्ञेचा अर्थ कळण्यासाठी कोणत्या तरी मार्गाने संकेत उमजावा लागतो. नव्या संज्ञा घडवणे शक्य आहे कारण संकेत समजावून देणे शक्य आहे. संज्ञा रूढ करण्यासाठी मात्र कळणे पुरेसे नाही. पुरेशा वारंवारतेने ती संज्ञा त्या विशिष्ट संदर्भात वापरण्यात आली पाहिजे. भ्रमणध्वनी ही संज्ञा कशासाठी वापरतात हे मराठीशिक्षित व्यक्तींना आजकाल माहीत असते. त्याचा वापर कमी प्रमाणात का होईना होतो. पण तो रूढ होण्यासाठी अनिल थत्ते ह्यांची वृत्तपत्रांतून वारंवार येणारी जाहिरात ही कारणीभूत ठरली आहे. ड्राइव्हला खण म्हटल्याने पहिल्या वेळी त्यामागची संकल्पना कळणार नाही हे मला मान्य आहे. पण ती कधीच कळणार नाही असे नाही. किंबहुना मी प्रात्यक्षिक दाखवत खण हा शब्द वापरला तर कळायला अडचणही येणार नाही. ड्राइव्ह ह्या शब्दाचा संगणकासंबंधीचा अर्थ मला तरी असाच कळला होता. तेच खण ह्या संज्ञेबाबतही घडेल.

भाषाशुद्धीच्या भूमिकेमुळे रुळलेल्या शब्दांची हकालपट्टी होते आणि त्यामुळे भाषा बोजड/दुर्बोध होते असा एक मुद्दा चर्चेत आला आहे. दुर्बोधपणा रुळलेले शब्द बदलल्यामुळे अवतरतो हा ध्वनी मात्र सर्वस्वी योग्य नाही. जर दिलेला पर्याय चांगला नसेल तर दुर्बोधपणा येऊ शकेल. पण असे नेहमीच होईल असे नाही. दुर्बोधपणा टळावा ह्यासाठी काही काळजी घ्यावी लागेल हे मी लेखात म्हटले आहे. ट्रॅक्टरला शासन-व्यवहार-कोशात कर्षित्र असा पर्याय सुचवला आहे. तो नक्कीच दुर्बोध आहे. पण त्याऐवजी नांगरगाडा म्हटले तर ते दुर्वोध वाटणार नाही.

भाषेतले शब्द हे केवळ भाषाशुद्धीच्या चळवळीमुळेच बदलतात असे नाही. वेगवेगळ्या प्रभावांमुळेही बदलतात. अलीकडे इंग्रजीच्या प्रतिष्ठेमुळे अनेक लोक रूढ मराठी शब्दांच्या जागी सररास इंग्रजी शब्द वापरतात. सोमवाराला मण्डे, भाताला राईस, वाढण्याला सर्व्ह कर, नवऱ्याला मिष्टर, बायकोला मिसेस, चुलतभावाला/आतेभावाला/मामेभावाला कझीन असे म्हणतात. ते हेतुतः करत नसतील पण त्यामुळे रुळलेले शब्द हद्दपार होतच असतात. खरे तर भाषा बदलते हे एकदा मान्य केले की ती वेगवेगळ्या कारणांनी बदलू शकते हे आलेच.

परकीय शब्दांना मराठीची व्याकरणव्यवस्था लावून मराठी करून घेणे हा एक मार्ग आहे आणि तो मला मान्य आहे. पण तो मी सगळीकडे वापरणार नाही. मला चांगली मराठी संज्ञा सुचत असेल तर मी ती आधी वापरीन. 'क्लिक्'करता मला 'टिकटिकव' हा धातू सुचला. त्यामुळे मी 'अमुक अमुक ठिकाणी टिकटिकवा' असे म्हणतो. संज्ञा सुचत नसेल तिथे मराठी व्याकरण लावून ते शब्द चालतील.

भाषेत खऱ्या अर्थी लोकशाही असते, लोक जे शब्द वापरतात तेच टिकून राहतात हे मत बरोबर असेल तर मग कुणी रूढ शब्दांना वेगळ्या संज्ञा वापरल्या तर आपल्याला ते त्याला बिचकायचे खरे तर कारणच नाही. पण आपण बिचकतो ह्याचे कारण लोकांनी कोणते शब्द वापरावे ह्याबद्दल आपल्या काही धारणा असतात आणि कोणत्या तरी प्रभावामुळे लोक कोणते शब्द वापरतात हे बदलू शकेल हे आपल्याला जाणवत असते. हा प्रभाव अनेक प्रकारचा असू शकतो. प्रतिष्ठितांच्या भाषेचा, कोणत्या तरी चळवळीचा, बदलत्या परिस्थितीचा इ. त्यामुळे नव्या संज्ञा घडवा इंग्रजीतल्या सरसकट वापरू नका हे म्हणणाऱ्यांचाही काही प्रभाव पडणे शक्य आहे.
चर्चेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ह्या सर्व संज्ञा घडवू पण संगणकाच्या पडद्यावर मला इंग्रजीच संज्ञा दिसणार असतील आणि व्यवहारात इतरांशी बोलताना त्याच वापराव्या लागणार असतील तर हा व्यापार व्यर्थ नव्हे का? मुद्दा अत्यंत योग्य आहे. त्याचे अंतिम उत्तर आज माझ्यापाशी नाही. पण परिस्थिती आहे तशीच राहात नाही. प्रयत्नांनी समाजात काही बदल घडवता येतात ह्यावर माझा विश्वास आहे तोवर चांगल्या मराठी संज्ञा घडवता आल्या तर त्या घडवाव्या, रुळवता आल्या तर रुळवाव्या असा प्रयत्न नक्की करता येईल.

  मात्र एखादी भाषा घडवून तिला अमुक एक रूप देणे शक्य आहे हे पटत नाही. (असा यशस्वी प्रयत्न झाला असल्यास त्याविषयी वाचायला आवडेल.) वेगळ्या संज्ञा वापरल्या तर बिचकायचे कारण इतकेच की समजण्यास त्रास होतो. आणि तसा वारंवार होत राहिला तर त्या संज्ञा अर्थातच वापरातून नष्ट होतील. संज्ञा घडवण्यामागचा हेतू चांगला असला तरी तो व्यावहारिक आहे का याविषयी शंका वाटते.

एखादा प्रतिशब्द दुर्बोध वाटतो किंवा नाही हे त्याचा वापरच ठरवतो. नुकताच उपक्रमावर data या शब्दाला विदाऐवजी आत्त हा नवीन शब्द दिसला. वापरूनही पाहिला. काही लाख लोकांनी वापरायला सुरूवात केली तर रूढही होईल.

भाषा घडण्यामागे त्या काळातील संस्कृती, राहणीमान, इतर संस्कृतींबरोबरची देवाणघेवाण अशा कितीतरी गोष्टी असतात. त्यामुळेच एखाद्या भाषेला विशिष्ट लहजा असतो. शिवाजीमहाराजांच्या काळात अनेक फारसी, उर्दू शब्द आले पण यामुळे मराठी भाषा दूषित न होता समृद्ध झाली. या बाबतीत इंग्रजीचे उदाहरण घेण्यासारखे आहे. आताच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे देवाणघेवाणीचा वेग प्रचंड आहे. साहजिकच अधिकाधिक नवीन शब्द येणारच.

इंग्रजी शब्द केवळ प्रतिष्ठेसाठी वापरले जातात याबद्दल सहमत नाही. त्यांचा वापर प्रचंड आहे आणि ते वापरायला सोपे जातात हे कारण अधिक सयुक्तिक वाटते.

अवांतर : पुलंच्या एका पुस्तकातील उदाहरणः
जो माणूस पुस्तकातून मराठी शिकला आहे तो "या उपाहारगृहात कोणते उष्ण खाद्यपदार्थ आहेत?" असे विचारेल. "गरम काय?" हे त्याला सुचणार नाही. मुद्दाम तयार केलेल्या संज्ञांमुळे भाषेला बरेचदा कृत्रिम स्वरूप येते असे वाटते. 

 

मराठीकरण का करायचे?
मुळात मराठीकरण म्हणजे काय? असाच प्रश्न माझ्या समोर उभा रहातो आहे.ओपन ऑफिस सारख्या एखाद्या संगणकीय कार्यक्रमामधे मराठीतून लिहिता येण्याची सुविधा निर्माण करणे म्हणजे मराठीकरण हाच अर्थ श्री. सुशांत यांना अपेक्षित असला तर मग ते होतेच आहे. त्याच्यासाठी आंदोलन उभारण्याची काय जरूरी श्री. सुशांत यांना वाटते ते समजले नाही. परंतु या पेक्षा दुसरा कोणता अर्थ श्री. सुशांत यांना अभिप्रेत असला तर तो त्यांच्या लेखातून स्पष्ट होतो आहे असे मल वाटत नाही. माझ्यापुरते बोलायचे तर मला मराठीकरण या शब्दाचा अर्थच समजू शकत नाही.
अस्मितेचा अविष्कार करण्यासाठी मराठीची आवश्यकता

मी गेले दीड वर्ष आंतरजालावर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतून लेखन करतो आहे. मराठी मधून लिहिले म्हणजे माझी अस्मिता जागृत होते व इंग्रजीमधून लिहिले म्हणजे ती विझते असा काहीही अनुभव मला नाही. इंग्रजीमधून लिखाण केले म्हणजे माझी भाषा, माझे राष्ट्र यांच्य बद्दलचे माझे प्रेम कमी होते असाही अनुभव मला नाही. 1962 च्या चीन भारत युद्धाबद्दल मी एक लेखमाला मराठीतून लिहिली होती. तर नद्यांचे पाणी चीन कशा पद्धतीने गिळंक्कृत करण्याचा प्रयत्न करतो आहे या विषयाबद्दल लिहिताना तो लेख इंग्रजीमधे लिहिणे मला जास्त श्रेयस्कर वाटले. लेखकाच्या डोळ्यासमोर कोण अपेक्षित वाचकवर्ग आहे त्याप्रमाणे लेखनाची भाषा वापरणे गरजेचे कसे असते या साठी हे उदाहरण मी दिले आहे. मराठीतून लिहिल्यामुळे अस्मिता कशी जागृत होते हे गौडबंगाल मला तरी उलगडत नाही.
भाषासमृद्धीसाठी इतर भाषांतून शब्द घ्यायलाच हवेत असे नाही.

या लेखात लेखकाने मराठी लेखांच्यात इंग्रजी शब्द वापरण्यास असलेला त्याचा विरोध सौम्य केला आहे असे दिसते. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज वाटत नाही. तरीही या लेखात असे शब्द वापरण्याची गरज नाही असे त्याला वाटते. हा वैयक्तिक आवडीचा भाग झाला. जो शब्द माझ्या जास्तीत जास्त वाचकांना समजू शकेल तो मी वापरतो. या बाबतीत बरीच उदाहरणे मागच्या चर्चेत उपक्रमींनी दिली आहेत. ती परत उगाळण्यात अर्थ नाही परंतु असे शब्द न वापरणे श्री. सुशांत याना आवडत असेल तर त्यांनी जरूर ते वापरू नयेत. दुसर्‍यांनी तसेच केले पाहिजे हा हट्ट योग्य वाटत नाही.
मुळात मराठी जितकी जास्त वापरात येईल तितकी ती जास्त समृद्ध हो ईल हे सूत्र ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळेच इतर भाषांतील शब्दांचा वापर काय? किंवा भाषाशुद्धी काय हे दोन्ही पैलू मला कमी महत्वाचे वाटतात. काही वेळा अशुद्ध लेखनाच्या फिरक्या घेण्याचा मोह मला आवरत नाही हे मी मान्य करतो. परंतु माझे हे असे करणे योग्य नव्हे हे मला जाणवत असते. आपल्याला जी मराठी लिहिता येते ती लिहून आपले विचार मांडणे महत्वाचे असते. लिहित गेले की भाषाशुद्धी होते.लिहित रहाणे हे आवश्यक असते. परंतु आपल्याला चांगले व शुद्ध मराठी लिहिता येते म्हणून काहीतरी जडबंबाल व आशय नसलेले पोकळ लेखन काही मंडळी करताना दिसतात. त्याला मात्र माझा नक्कीच आक्षेप आहे. मोजक्या शब्दात आपल्याला काय सांगायचे आहे ते सांगितले तर ते जास्त प्रभावी ठरते असा माझा अनुभव आहे. उपक्रमवरचे काही लोक असे लेखन नेहमीच करतात व ते वाचायला मला आवडते. 

 

 

 

 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...