Wednesday, July 3, 2024

विष्णु मुर्ती ( अंतिम )

विष्णू  

(सुरुवातीपासून सुमारे सहाव्या शतकापर्यंत)
सृष्टीच्या तीन स्थिती अर्थात् उत्पत्ती, स्थिती आणि लय, यांच्या आधारभूत देवता म्हणून ब्रह्मदेव, विष्णू व शंकर यांस मान्यता आहे. त्यापैकीं येथे विष्णूचा विचार करू.
     ऋग्वेदामध्ये विष्णू ही प्रमुख देवता नाही, असे सर्व अभ्यासकांचे मत आहे. वेद काळामध्ये प्रमुख उपास्य देवतांमध्ये इंद्र, वरुण, अग्नि आदी देवांचे उल्लेख येतात. तसेच अन्य देवतांमध्ये रूद्र आणि विष्णू यांची गणना होते. महाभारतामध्ये विष्णूचे बरेच उल्लेख येतात आणि नंतरच्या काळामध्ये विशेषतः भक्तिमार्गातील विष्णू ही एक प्रमुख देवता झालेली आपल्याला दिसते. या काळात वासुदेव, संकर्षण (बलराम) यांचे प्रतिमा रूपात पूजा सुरू झाली.
विष्णूच्या मान्यतेचे धागेदोरे ऋग्वेदांपर्यंत पोहोचलेले आहेत. ऋग्वेदांच्या एकूण सहा सूक्तांत' त्याचे उल्लेख मिळतात.
या सूक्ताचा साकल्यानें विचार केल्यास खालील गोष्टी दृष्टोत्पत्तीस येतात.
१) इतर देवताच्या मानाने विष्णूशी संबंधित सूक्तांची संख्या फारच थोडी असली तरी त्यांत केलेले वर्णन मात्र अत्यंत उदात्त व भव्य स्वरूपाचे आहे.
२) कोणत्याही सूक्तांत मूर्तिविज्ञानाच्या दृष्टीनें विष्णूंचे स्वरूप वर्णन मिळत नाही, पण त्यानें तीन पावलांत पृथ्वी, अंतरिक्ष व इतर सर्व लोक व्यापून टाकले याबद्दल त्याची वारंवार स्तुती आहे. 'उरुगाय,' 'उरुक्रम' वगैरे विष्णूंची वैदिक नांवे पुढील युगांत वर्णन केलेल्या त्रिविक्रम रूपाशी संबंधित आहेत. 'विष्णूंच्या दोनच पावलांना माणसे पाहू शकतात, त्याचे तिसरे पाऊल अर्थात् परमपद याकडें विद्वान लोक टकमक बघत असतील' (१,२२.२०) वगैरे वर्णन त्यांच्या त्रिविक्रमत्वाचेच होय. एक सूक्त (७.१००,४) असेंही सुचवितें की विष्णूनें शेतीसाठी व मनुष्यांना राहण्यासाठी पृथ्वीचे तीन वेळा आक्रमण केले.
३) विष्णूजवळ अमृताचा अक्षय झरा आहे, असेच अतिशय चपळ आणि अनेक शिंगे असलेल्या दिव्य गाई ही आहेत.
४) विष्णुभक्तीचे मूळ ही आपणांस येथे सापडतें. विष्णूच्या अमाप प्रभावानें प्रेरित होऊन त्याला हाक मारल्यास (म्हणजे भक्ति केल्यास) तो येऊन उभा राहतो व (भक्तांचे) संरक्षण करतो ही कल्पना वैदिक काळातच रूढ झाली होती.

 विष्णु, राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली
 
     काही सूक्तांत' 'इन्द्रा-विष्णू' या नांवाने इंद्र व विष्णू अशा जोडदेवतांचे स्तवन केले आहे. विष्णूस इंद्रासह एकत्र राहणारा असा त्याचा मित्र मानला आहे. (१.२२ १९) पर्वताच्या शिखरावर दोघे उंच उभे राहिले आहेत (१,१५५ १) व त्यांचे घोडे शत्रूला चिरडून टाकण्यांस समर्थ आहेत. (६.६९ ४) हे दोघे अत्यंत पराक्रमी आहेत. बैलाच्या डोक्याच्या  आकाराची शिरस्त्राणें (वृषशिप्र) वापरणाऱ्या दासाच्या मायेचा यांनी विनाश केला, तसेंच शंबर राजाची नव्याणव नगरें खिळखिळी करून उध्वस्त केली व 'वचि' नामक राजाचा त्याच्या सैनिकासह धुव्वा उडवून दिला (७.९९ ४-५) अशा प्रकारचे या जोडदेवतांचे वर्णन ऋग्वेदांत आढळते. या प्रमाणें ऋग्वेदांतील 'इंद्रा-विष्णु' हे पौराणिक काळातील नरनारायण अथवा कृष्णार्जुन होत हे ओळखणें फारसे कठिण नाही. कृष्ण हा नारायणांचा अवतार व अर्जुन अपर नांव 'नर' हा इंद्रांचा पुत्र म्हणजे त्याचेच स्वरूप होय ही युक्तिसंगत मांडणी आहे.
     ऋग्वेदाच्या पुरुषसूक्तांत सांगितलेला 'वराट' हा नारायण किंवा विष्णूचेच स्वरूप होय असेही विद्वानांचे मत आहे. शुक्लयजुर्वेदाच्या उत्तरनारायण भागांत 'पुरुषाच्या' श्री व लक्ष्मी अशा दोन पत्नीचेही उल्लेख सापडतात. उत्तर वैदिक काळांपासून विष्णुचे महत्त्व वाढू लागले. या गोष्टीस 'पाञ्चरात्र' मतानेंही बरीच मदत केली. परंपरेंप्रमाणें या शास्त्राचा उगम शुक्ल यजुर्वेदाच्या 'एकायनशाखा' या नांवानें ओळखल्या जाणाऱ्या काण्वशाखेपासून आहे. पुढे पाञ्चरात्र वाङ्मयाचा विस्तार फार मोठा झाला व त्यांत अनेक संहिता, आगम व उपनिषदें तयार झाली. महाभारतादि ग्रंथ व पुराणसाहित्य यावरही त्यांचा चांगलाच प्रभाव पडला. पाञ्चरात्र मतानें वासुदेव विष्णुसह संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध असे चार व्यूह कल्पून यांच्या उपासनापद्धतीवर जोर दिला व त्यातूनच पुढें विष्णूची चोवीस रूपें एकोणचाळीस पर्यंत अवतारांची संख्या, मंडलें व परिवार देवता या सर्वांचा उदय झाला.


      विष्णुपूजेच्या विकसित स्वरूपाचे दर्शन महाभारतांत व भागवतादि अनेक पुरातनग्रंथात होते. विष्णू हा देवाधिदेव आहे, भक्तांच्या हाकेला ओ देऊन वैकुंठ लोकात निवास करणारा हा देव धाऊन येतो, देवांचा छळ करणाऱ्या दैत्य व असुरांचा संहार करून 'साधूचे परित्राण' व 'धर्मस्थापना' या करिता हा युगांयुगांत अवतार घेतो, जरूरी प्रमाणे हे अवतार पशु, पक्षी किंवा मनुष्यरूपात असतात. कधीकधी कपटानें विरोधकांत नास्तिक मतांची स्थापना करण्यांकरिताही तो अवतार घेतो, वगैरे विचारांची मांडणी, या ग्रंथात सापडते व ती समाजात ही दृढमूल झालेली दिसते, हा देव सात्विक प्रवृत्तीचा असून लोकरंजन व लोकमंगल करणारा आहे.
   'तंत्र' मताने ही विष्णूच्या उपासनेचे विवेचन केले आहे, पण आता ते शैव किंवा नाही. 'अभिचारिक' स्वरूपाची विष्णू-मूर्ती प्रामुख्यानें आढळल्याचे ऐकिवांत नाही.
इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील नाणे घाटातील शिलालेख, बेसनगरचा शिलालेख, घुसुंडी (राजस्थान) येथील शिलालेख यात हे उल्लेख आढळतात. परंतु या काळातील एकही मंदिर किंवा मूर्ती न सापडल्यामुळे याचे शिल्पांकन कसे असावे हे सांगता येत नाही. इ.स. पूर्व पहिल्या शतकातील बलरामाचे एकच शिल्प सापडले आहे.
     प्रतिमाशास्त्राच्या क्षेत्रात विचार केल्यास आजपर्यंत भारतीय कर्लेत कुषाण काळाच्या पूर्वी उत्तरभारतांत विष्णुप्रतिमा आढळल्याचे माहीत नाही. कृषाण काळ अर्थात् सुमारे इसवी सनाच्या पहिल्यापासून तिसऱ्या शतकांच्या दरम्यानचा काळ! या काळांत मथुरा व तिच्या आसपास लोक विष्णूंच्या मूर्ती घडवित असत. या प्रकारच्या बऱ्याचशा प्रतिमा आज अनेक ठिकाणी सुरक्षित आहे. त्यामुळे पर्यायाने असे गृहीत धरले पाहिजे कीं जरी कुषाण काळाच्या पूर्वीची विष्णुप्रतिमा आज प्रत्यक्ष उपलब्ध नसली तरी तिच्या निर्मितीची मुळे बरीच मागें पर्यंत गेलेली असावीत. ही गोष्ट नाण्यांकडे लक्ष दिल्यास आपोआप सिद्ध होते.

जुन्या नाण्यांवर विष्णू :

      सुरुवातीपासून कुषाणकाळापर्यंतच्या सोने, चांदी व तांब्याच्या नाण्यावर शिव, सूर्य, कार्तिकेय, वगैरे तर दिसतात, पण विष्णूचे मात्र क्वचितच दर्शन घडतें पांचाल शासक विष्णुमित्र याच्या (इ.पू. १ले शतक) नाण्यांवर विष्णू आहे पण छोट्या आकाराच्या  नाण्यावरील प्रतिमेचा आयुधादिकाच्या दृष्टीनें खोल अभ्यास करणें शक्य नाही. पण या उलट ऐखनूम येथे मिळालेल्या भारतीय ग्रीक राजा अँगथोक्लियस (सु. १८०-६५ ई.पू.) यांच्या नाण्यावर कृष्णबलराम स्पष्टपणे आढळतात. त्याचा विचार आपण पुढे करू. कुषाण राजा हुविष्क यांच्या एका नाण्यावर विष्णू आहे असें दिनेशचंद्र सरकारचे मत आहे, पण ते सर्वसामान्य नाही. पण याच काळातील एका दुसऱ्या तांब्याच्या शिक्यावर स्पष्टपणें एक सुंदर विष्णू आहे. त्यांच्या खालच्या उजव्या हातांत गदा, वरील हातांत एक गोल वस्तू, वर डावीकडे शंख (?) आणि खालच्या हातांत चक्र आहे. विष्णूचें शरीर चांगले गुटगुटीत असून त्याच्या समोर मुकुट घातलेला एक पुरुष हात जोडून उभा आहे.
कुषाण राज्याच्या नाण्यांवर विष्णू नाही. गुप्तांच्या नाण्यांवर गरुड, गरुडध्वज हे तर दिसतात पण प्रत्यक्ष विष्णु फक्त 'चक्रविक्रम' प्रकारच्या नाण्यांवर आहे.
 
 कुषाणकाळातील नाण्यावर असलेला विष्णु
 
 भारतीय ग्रीक राजा अँगथोक्लियस (सु. १८०-६५ ई.पू.) यांच्या नाण्यावर कृष्णबलराम

 कुषाण कालीन विष्णूचे साधारण स्वरूप :

      या काळातील सुमारें ५० प्रतिमा आपणास माहीत आहेत. त्यांपैकी सुमारे ४० मधुरेच्या क्षेत्रांतच मिळालेल्या आहेत. त्यावरून कुषाण कालीन विष्णू प्रतिमेचे सामान्य स्वरूप ठरविणें सोपे आहे. त्याची साधारण रुपरेषा खालीलप्रमाणें दाखविता येईल !
१) ह्या सर्वच प्रतिमा आकारांत लहान असून इकडून तिकडे हलविण्यांस आटोपशीर अशा आहेत.
२) विष्णु मूर्तीची घडण यक्ष-प्रतिमेंवर आधारलेली आहे. इसवीसनाच्या सुमारे तीन शतकें आधीपासून लहान- मोठ्या आकाराच्या यक्ष मूर्ति बऱ्याच लोकप्रिय होत्या. अभयमुद्रेत उचललेला उजवा हात, कमरेवर ठेवलेला डावा हात, दोन्ही भुवयांच्या मध्यें ठळकपणे दिसणारे गोल 'उर्णा' चिन्ह, समभंग स्थितीत ताठ उभे राहण्याची कथित पद्धत, काष्टा घालून पुढें सोगा सोडलेले नेसूचे धोतर व मोजके दागिने ही यक्ष प्रतिमांची वैशिष्ठ्ये होत. कुषाण कालीन विष्णुप्रतिमेंत या सर्व गोष्टी दिसतात.
३) क्वचित अपवाद वगळल्यास सर्व प्रतिमा चतुर्भुज असून त्यांत प्रदक्षिणाक्रमानें गदा, चक्र, शंख किंवा काही नामोजक्या स्थानी जलपात्र, अशी आयुधे आढळतात.
४) उजवा हात अभय मुद्रेत असणें हें देवत्वाचे द्योतक होय व म्हणूनच हे लक्षण बुद्ध, लक्ष्मी, कार्तिकेय वगैरे प्रमाणें विष्णुप्रतिमेंत ही दिसते. या हातांत कोणतेही आयुध देत नसतात. मात्र बुद्धाच्या व विष्णूंच्या अभय मुद्रेत दिसणाऱ्या तळहातांवरचा एक फरक लक्षांत ठेवण्यांसारखा आहे. बुद्ध, बोधिसत्त्व, जैन तीर्थकर वगैरेंच्या तळहातांवर चक्र त्रिरत्न व बोटांच्या पेरांवर स्वस्तिक, शंख, श्रीवत्स आदि मंगलचिन्हे दिसतांत. पण विष्णूंच्या तळहातांवर मात्र त्यांचा पूर्ण अभाव आहे. विष्णूच्यावर उचलेल्या उजव्या हातांस 'उद्यतपाणि' असे ही संबोधन आहे व त्याचे विशेष महत्त्वही सांगितले आहे."
५) कुषाणकलेंत प्रामुख्यानें दिसणारी गोष्ट म्हणजे प्रतिमेंची 'उभयवर्ती' घडण (carving in round). दर्शनी भागांप्रमाणेंच कुषाण शिल्पांचा पाठीकडचा भागही लक्ष पुरविण्यांसारखा असतो. येथे पाठीचे सुंदर अंकन, तिजवर रुळणारा केशसंभार (र.चि. चौदा. २) अथवा फुलें व फळांनी बहारलेला एखादा वृक्ष दिसतो. कधी कधीं वृक्षांच्या फांद्यावर बसलेले पोपट व चिमुकल्या खारी स्वाभाविकर्तेत भर टाकतात. विष्णुशित्यांत बहुतेक देवाची पाठ दिसते. फक्त एका प्रतिमेत (म.सं.सं १४. ३९२-३९५ चित्र-६) वृक्षाचे दर्शन होते.
६) विष्णूच्या सामान्यापेक्षां जास्त असलेल्या दोन हातांची घडण सुद्धां विचार करण्यांसारखीं आहे. क्वचित अपवाद सोडले तर हे हात कुषाण कालीन मूर्तीत वर उचललेले असतात. ह्या प्रकांरास 'उद्बाहू' असें म्हणतात. हे हात खाद्यांपासूनच वेगळे झालेले दिसतात (रे. चि.तेरा. १ चौदा २)




काही कुषाणकालीन विष्णु मुर्ती

मिशा असलेला विष्णू

     पीलीबंगा (हनुमान गट) राजस्थानात येथून उत्तर-कुषाण कालीन खडू (कॅओलीन) ची मूर्ती मिळाली आहे. हिचा छाती खालचा भाग तुटलेला असला तरी ही महत्त्वाची आहे. कारण येथे विष्णूच्या मिशा दाखवल्या आहेत, उजव्या हातांत गदेचे टोक आणि डाव्यात चक्र दिसते. विष्णूला मिशा हा गांधार कलेचा प्रभाव आहे. शंकराला देखील मिशा असलेल्या प्रतिमा तिकडे मिळाल्या आहेत. तूर्त हे शिल्प राजस्थान च्या बीकानेर संग्रहालयांत आहे.
- R.C. Agrawala, Rajasthan Contribution to early Brahmanic Iconography IIA., Fig. 2, p. 14, 15
- रत्नचंद्र अग्रवाल, 'पीलीबंगा से प्राप्त विष्णू फलक', वैचारिकी बीकानेर, २५, (३), २००९, पृ. २०-२३.

मुकुट घातलेले विष्णूचरण

     मथुरा येथून मिळालेल्या छोट्याश्या कुषाण कालीन बैठकीवर (तूर्त बर्लिन संग्रहालय) विष्णूच्या पायांना 'कुषाण पद्धतीचा उभयसाधारण असा मुकुट घातला आहे, त्याचा सोगा ही पाठी मागे दाखवला आहे. पावलाच्या डावीकडे चक्र आहे, उजवीकडे शंख किंवा गदा असू शकते. (रे.चि.वि. १)
- N.P. Joshi, Workship of Visnu's Feet, a Unique representation, SS., VIII, 1995, PI. a,b p. 74; N.P. Joshi, Some Unique and Rase Sculptures, Kala, XI, 2004-05, p. 74.

 कुषाणकालीन मुकुट असलेल्या विष्णु मुर्ती

द्विभुज विष्णू

    पाली, राजस्थान येथून मिळालेली ही मूर्ती (तूर्त जोधपूर संग्रहालय) सुमारे ४-५ व्या शतकातील आहे. देव उभा असून प्रलम्ध पद्धतीचे दोन्ही हात खंडित आहेत उजव्या हातांत गदा होती, तिचा जमिनीवर टेकलेला गोळा अजून दिसतो. देवाचा उभा मुकुट, रूळणारी वनमाला आणि कमरेभोवती गुंडाळलेले उन्तरीय ही सुरेख आहे. (रे.चि.ति.२)
Vaisnavism in Indian Art and Culture, Ed. R. Rarimoo, New Delhi 1987, Fig. 27 p 233
      उजव्या हातांत दंड व डाव्या हातांत शंख घेतलेला सुमारे ३-४व्या शतकातील दोन हाताचा स्थानक विष्णू येल्लेश्वरम्, आंध्रप्रदेश येथे असल्याची नोंद झाली आहे.
I.K. Sarma, Fresh Evidence on Cult. of Narasimha IAH., 1990
 
द्विभुज विष्णुची मुर्ती

गुप्तकालांतील परिवर्तनें :

 कुषाणनंतर उत्तर भारतात गुप्त राजांची राजवट सुरू झाली. कुषाण कालानंतर विष्णूच्या प्रतिमा या गुप्त काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या प्रारंभा पासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पूर्णपणे विकसित झालेल्या दिसतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे गुप्त राजे हे स्वतः वैष्णव धर्माचे अनुयायी होते आणि ते स्वतःला परमभागवत म्हणत असत. राजश्रय मिळाल्यामुळे गुप्तांच्या कारकीर्दीत ब्राह्मणधर्माच्या मूर्तीचे वैविध्य वाढले. ह्या काळांपर्यंत निरनिराळ्या शास्त्रांचा ही चांगलाच विकास झाला होता. मूर्तिशास्त्र ही त्याला अपवाद नव्हते. या शास्त्राची कुषाण कालांत मुहूर्तमेढ रोवली गेली होती. आता तिच्यावरील इमल्यानें चांगलाच आकार घेतला. इकडे पुराण ग्रंथांचे संकलन पुरे झाले व त्यात मूर्तिनिर्माणांविषयी बरीचशी माहिती साठवली गेली. मत्स्यपुराण, अग्निपुराण वगैरेंनी या विषयांवर स्वतंत्र अध्याय लिहिले. विष्णू धर्मोत्तरांसारख्या उपपुराणांनी या विषयाचे विवेचन करण्यांसाठी खंडेच्या खंडे खर्ची घातली वराहमिहिरासारख्या ज्योतिष पंडितानें देखील याचा विचार केला.
  या काळात घडविलेल्या मूर्ती मोठ्या संख्येने सापडलेल्या नसल्या तरी कलात्मकदृष्ट्या खूपच सरस होत्या. याचे कारण असे की याच कालखंडामध्ये देवदेवतांच्या मूर्तीचे प्रमाणीकिकरण निश्चित केले असल्यामुळे मूर्तिकलेला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. गुप्त राजांच्या सार्वभौम राष्ट्र या संकल्पनेनी सर्व देश प्रभावित झाला होता. याच राजांच्या दरबारात प्रख्यात कवी, नाटककार कालिदास होता मानले जाते. या काळातील विशेषतः शिल्पकलेला आलेली परिपक्कता आणि प्रगल्भता ही ती काळामध्ये ध्वजगजाप्रमाणे मार्गदर्शक ठरलेली आहे. हा प्रभाव इतका खोलवर होता की तेराव्या शतकामध्ये झालेल्या मुस्लिमांच्या आक्रमणांमुळे लयास जाईपर्यंत गुप्त काळातील ही मार्गदर्शक तत्व टिकून होती. याबद्दल आनंदकुमारस्वामींसारखे थोर अभ्यासक असे म्हणतात, "इथे आपल्या आधीच्या काळातील आदिम गुणधर्म आणि तदअनुशंगानी येणारा अभिव्यक्तीमधला भाबड़ेपणा संपलेला होता. एकीकडे त्याचे आत्मसंतुलित सुसंस्कृत आणि काटेकोर शास्त्राने बध्द नियमावलीत बसवलेले स्वरूप असले तरीही दुसरीकडे अभिव्यक्तीमध्ये जीवनोन्मादाने भरलेला उल्हासित प्रकटीकरण दिसते. या काळापर्यंत किंवा आधीच्या काळातील असणारे परकीय प्रभाव पचवले गेले होते, एव्हढेच नाही तर त्यांचे पूर्ण भारतीयकरण झाले होते. प्राचीन काळापासून प्राप्त केलेल ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान हे कलेच्या अभिव्यक्तीशी तादात्म्य पावलेले दिसते. अनंतक ध्यासातून उमगलेले व अनुभूत झालेल्याचेच हे स्थूलीकरण होते. ज्ञानेंद्रीये ही ज्ञान प्राप्तीची कवच असली तरीही बुद्धीचे उन्नयन करून आत्मज्ञानाचीही प्रवेशद्वारे आहेत. कला ही तत्त्व आणि पार यांच्यातील संवाद साधणारा समान दुवा झाल्यामुळे हीच कला अमूर्त (प्रतीकात्मक) तरीही इंद्रियगर सांकेतिक तरीही भावोत्कट झालेली दिसते." (कुमारस्वामी : १९६९, पृ.४५) 
शेषारुढ आसन अवस्थेतील विष्णु

    वरील विधानांचे मूर्तिमंत पुरावे आपल्याला गुप्त काळातील अवशेषांमध्ये दिसतात. देवगड (म.प्र.) इथे दशावतारांच्या दहा मंदिरांचा समूह होता असे म्हणतात. त्या ठिकाणी सध्या एक छोटेखानी मंदिर अस्तित्वात आहे. या मंदिरावरील शिल्पकला मात्र अत्यंत विलोभनीय आहे. विष्णुच्या वेगवेगळ्या रूपांचे इथे शिल्पांकन दिसते. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराभोवती नंद आणि यशोदा हे बाल बलराम आणि बाल कृष्णाला घेऊन उभे आहेत असे विलोभन शिल्प आहे. त्याच दाराच्या तुळईवर बेटोळे घातलेल्या शेषावर बसलेल्या विष्णूचे शिल्प आहे, त्या नरसिंह व वामन नमस्कार करतांना दाखविले आहेत.
शेषशायी विष्णु ( देवगड , मध्य प्रदेश )

 देवळाच्या उत्तर भिंतीवर शेषशाही विष्णु संभवतः भारतातले सर्वोत्तम असे शिल्प आहे. यामध्ये उजवा पाय किंचित दुमडलेल्या अवस्थेत उचललेला आणि डावा पाया सरळ अशा स्थितीत सात मुखाच्या शेष्याच्या बेटोळ्यावर पहुडले विष्णूचे शिल्पांकन आहे. या विष्णूला चार हात असून त्याचा वरचा डावा हात त्याने दुमडून उशीसार डोक्याखाली घेतला आहे, आणि खालचा डावा हातही दुमडलेला असून तो शेष्याच्या मंचकावर टेकवलेला त्याचा वरचा उजवा हात दमडलेला असून तो शेषाच्या एका मुखापाशी आहे. तर त्यान उजवा खालचा हात हा त्याच्या शरीरालगत सरळ असून त्याच्या उजव्या मांडीवर टेकलेला आहे. त्याच्या पायाशी त्याची पत्नी लक्ष्मी किंवा भूदेवी बसलेली आहे. ती तिच्या उजव्या हाताने त्याच्या उजव्या पायाची बोटे मुडपते आहे आणि त्याच्या किंचित उचललेल्या उजव्या पायाखालून तिने तिचा डावा हात घातला असून ती त्याच्या उजव्या पायाची पोटरी हलकेच दाबून देते. तिच्या मागे एक चवरीधारी दासी उभी असून दासीच्या शेजारी डावीकडे गळ्याभोवती गुंडाळलेल्या सर्पाची मान धरलेला मनुष्यरूपी गरुड उभा आहे. शिल्पाच्या वरच्या भागात मधोमध कमळावर पद्मासनात बसलेला चार मुखांचा ब्रह्मदेव आहे. ज्याचा उजवा हात अभय मुद्रेत असून त्याच्यात त्याने अक्षमाला धरलेली आहे. त्याच्या डाव्या खांद्यावर त्याने मृगाजिन (मृगाचे कातडे) घेतलेले आहे. कमळाचे देठ खाली उतरलेले असले तरी ते विष्णूच्या नाभीतून उतरताना दाखवलेले नाही. ब्रह्मदेवाच्या उजवीकडे हत्तीवर इंद्र आणि मोरावर कार्तिकेय (ईशान) असून त्याच्या डावीकडे नंदीवर शिव, पार्वती आणि त्याच्या पलीकडे एक किन्नर गंधर्व दाखवलेला आहे. सर्पाच्या वेटोळ्या-खालील भागामध्ये डावीकडून पाहिल्यास पहिल्या दोन व्यक्ती मधू आणि कैटभ हे दोन राक्षस आहेत (यांनी वेद चोरल्यामुळे विष्णूने हयग्रीव, घोड्याचे तोंड असलेल्या रूपात प्रकट होऊन त्यांना मारले आणि वेद परत मिळवले). या दोघांनी उजव्या हातात तलवार धरली असून त्यांचे डावे हात कमरे वर ठेवले आहेत. ह्यांच्या पलीकडे विष्णूची आयुधे चक्र, शंख पद्म, गदा, ही मनुष्य रूपात दाखवली असून पहिली व्यक्ती चक्रपुरुषा ऐवजी खडगपुरुष आहे, दुसरी व्यक्ती शंखपुरुष, तिसरी व्यक्ती पद्मपुरुष आणि शेवटी एक स्त्री दाखवली असून ती विष्णूची कौमोदकी नावाची गदा आहे. गदा हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे आयुधपुरुषांमध्ये ती स्त्री रूपाने दिसते. या शिल्पात वैशेषिक दर्शनामधील काळ संकल्पनेचे यशस्वी शिल्पीकरण केले असल्याचा प्रत्यंतर येतो. (वै.सू. २.२.६ - ९ • ९, संदर्भ राधाकृष्णन : १९९९) काळ विश्वव्यापी (नारायण) असतो, अवकाश व्यापत तो प्रवाही असतो (सर्प). त्याच्या उदरातून ब्रह्मांडाची उत्पत्ती होते (ब्रह्मदेव). याच्या पश्चिमेकडील भितींवर नरनारायण यांचे शिल्प आहे. या शिल्पामध्ये एक वयस्क व्यक्ती आणि त्याच्या शेजारी एक तरुण बसलेला दाखवला आहे. याला नरनारायण असे संबोधले गेले आहे याच देवळाच्या दक्षिण भिंतीवर गजेन्द्रमोक्षाच्या कथेचे शिल्पांकन आहे.

गजेन्द्र मोक्ष, गुप्त काळ, देवगढ़, मध्य प्रदेश (स्रोत: विकिपीडिया)

   शेषशायी विष्णूचे स्वतंत्र मंदिर गुजरातमधील वाळम येथे होते. परंतु आक्रमकांनी ते मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केले असल्यामुळे सध्या तेथे मंदिराचे अवशेष स्वरूप दोन चार मोठे दगड पडलेले दिसता या मंदिरात विष्णूच्या चोवीस मूर्ती होत्या त्या पैकी अठरा मूर्ती भग्नावस्थेत सापडल्या होत्या बडोद्यातील संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कर्नाटक मध्ये श्रीरंगपट्टण येथे शेषशायी विष्णूचे मंदिर आहे. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे त्याचे मूळ रूप पूर्णपणे बदलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये वीस फुटाहूनही अधिक लांबीची शेषशायी विष्णूची मूर्ती असून तेथे आज पूजाअर्चा आणि अन्य कर्मे सुरू आहेत. इ.स. २०१३ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे गावाती तलाव दुष्काळामुळे आटला होता त्यात एका विहिरीचे अवशेष आढळले. त्यात शेषशायी विष्णु शिल्प आढळले. त्यामुळे या वास्तूचे गूढ वाढले आहे. याचा काल निश्चित नाही.
     गुजरातमध्ये पाटण (पूर्वीचा मेहसाणा जिल्हा, सध्याचा पाटण जिल्हा) येथे सहस्रलिंग तलाव नावाचे स्थान आहे. या परिसरामध्ये सहस्रलिंग शिवाचे मोठे मंदिर आणि त्याभोवती अनेक मंदिवि समूह होता. (सहस्रलिंग म्हणजे शिवलिंगाच्या पिंडीवर छोट्या छोट्या इंग्रजी १ प्रमाणे १००० खुणा केलेल्या असतात. छोट्या खुणा म्हणजे शिवलिंगाचे छोटे रूप.) हा संपूर्ण परिसर प्रबंड गोल पाण्याच्या बांधलेल्या तलावांनी सुशोभित केलेला होता आणि त्या तलावांमध्ये कारंजीही होती. या परिसरामध्ये आज काही विशाल तलावांचे वाळलेले अवशेष आणि काही देवळांन पायथ्याचे अवशेष एवढेच शिल्लक राहिलेले आहेत. याच परिसराच्या शेजारी एक प्रचंड मोठा चिखलाने भरलेला आयताकृती खड्डा होता. त्याच्या एका बाजूला विहिरीसारखी गोलाई आलेला एक भाग थोडाफार दिसत होता. १९६० नंतर याच्याकडे पुरातत्त्व खात्याचे लक्ष गेले. त्यांनी तेथील थोडा बिखल काढून खालील वास्तूचा शोध घेण्याचे ठरवले. याचे कारण असे की त्याच पाटण गावा- मध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बरोटची बावडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बावडीचे बांधकाम झाले. ते करण्यासाठी काढलेल्या दगडांची ही खाण आहे असे स्थानिक लोकांनी सांगितले. 
चित्र क्र. ३१: रानी की वाव, पाटण

१९६० साली सुरू झालेल्या या उत्खननात जसा जसा या खड्यातला चिखल निघू लागला तसे आतून एक महान आश्चर्य उजेडात येऊ लागले. तो एक खड्डा जमिनीखाली बांधलेली बावडी समान वास्तू आहे हे उघडकीस येऊ लागले. पूर्व पश्चिम अशा पसरलेल्या या वास्तूच्या पश्चिमेकडील टोकाला संपूर्ण गोलाकार असलेली एक विहीर आणि त्याला जोडलेला लंबायताकृती हा उरलेला भाग असा याचा आकार आहे. आणि पूर्वेकडून प्रवेश केल्यावर सुमारे पंचवीस पंचवीस फुटाचे क्रमशः उतरत जाणारे चौथरे ज्याची विहिरीतल्या गोलाकार आकारापाशी पोचल्यावर एकूण खोली ही जवळ जवळ सत्तर फूट असून सात मजल्यां-मध्ये विभागलेले आहे. याचे उत्खनन करताना खालील गाळामध्ये पाणी ओतून त्याचा चिखल केला जाई आणि हा चिखल हाताने टोपलीत भरून बाहेर टाकला जाई यामुळे या उत्त्खननासाठी कुठलेही टोक असलेले शस्त्र वापरले गेले नाही. या वास्तूतील सर्व अवशेष मातीत गाडले गेले असल्यामुळे आणि सावध उत्खनन केलेले असल्यामुळे यामध्ये असलेल्या शिल्त्यांना धक्का लागलेला नाही आणि जवळ जवळ ९० टक्के शिल्पे ही सुस्थितीत सापडली. अनेक शतके मातीत गाडली राहिल्यामुळे त्या शिल्पांवर क्षारांचे थर चढल्यामुळे या शिल्पांच्या सौंदर्याला उणेपणा आलेला दिसतो परंतु त्यातील कलाकाराची प्रतिभा मात्र मूळ तेजातच झळाळून उठता दिसते. १९८६ पर्यंत या वास्तूच्या पुनर्निर्माणाचे काम चालले होते.या वास्तूच्या आतील भिंतींवर आणि विहिरीसारख्या गोलाकाराच्या आतील बाजूस पाचशेहून अधिक शिल्पे आहेत ज्यांची मांडणी एखाद्या मंदिरांच्या बाहेरील भिंतींवर केलेली आढळते अशीच आहे. आतील हे मूर्तिकाम आणि विहिरीच्या गोलाकारातील देवतांची रचना पाहिल्यावर हे विष्णुमंदीर असावे असे काही विद्वानांचे मत आहे. (मनकोडीः १९९१, पृ. २)
चित्र क्र. ३२ : रानी की वाव मधील शिल्पे

  विहिरीचा गोलाकार भाग आयताकृतीला जिथे मिळतो तिथे प्रत्येक मजल्यावर प्रवेशद्वार केले आहे. आयताकृती भागातून विहिरीत प्रवेश करण्यासाठी जणू हे द्वार आहे आणि या भागाची रचना देवळातील अंतराळाप्रमाणे आहे. सुमारे २०० फूट लांब आणि ८५ फूट रुंद पसरलेल्या या आयताकृती खड्याच्या लांब बाजूच्या भिंती मातीच्या रेट्याने आत कोसळू नये म्हणून त्यांना जोडणारे तीन आडव्या व्हरांडा रूपी बांधकामाने बळ दिलेले दिसते. हे सुमारे ६ फूट रुंदीचे असून वाढत जाणार खोलीप्रमाणे वाढीव मजल्यांचे बांधकाम आहे. अत्यंत कोरीव अशा स्तंभांभोवती आडव्या तुळ्या रचून केलेले हे बांधकाम बाजूच्या भिंती मातीच्या रेट्याने खचू नये म्हणून कल्पकतेने केले आहे. वास्तूच्या विहिरीसारख्या गोलाकारात प्रत्येक मजल्याच्या प्रवेशदाराच्या रेषेमध्ये आणि बरोबर समोर विष्णूचे शिल्प बसवलेले आहे. ज्यामध्ये खालील तीन अर्धगोलाकार थरावर शेषशायी विष्णूचे शिल्प आहे. या वरून हे शेषशायी विष्णूचे मंदिर असावे वाटते. शेषशायी विष्णूचे शिल्प हे साधारणतः मंदिरांमध्ये पूर्व-पश्चिम बसवलेले असते. आणि या बहुतांश शिल्पांमध्ये जशी पाय चुरणारी लक्ष्मी दिसते. तसेच विष्णूच्या नाभीतून उगविणाऱ्या कमळावर ब्रह्मदेवाचे शिल्प असते. श्रीरंगपट्टण येथील मंदिरात शेषशायी विष्णूचे पूजन होते, तिथे ही मूर्ती उत्तर दक्षिण पसरलेली आहे असे लक्षात येते. त्यामुळे त्या मूर्तीत दोन ठळक गोष्टी दिसतात. पहिली म्हणजे नाभीतून निधणाऱ्या कमळाचे किंवा त्यावरील ब्रह्मदेवाचे शिल्पांकन नाही आणि विष्णू झोपलेला नसून डोळे उधडून जागा असल्याचे शिल्पांकन आहे. पाटण येथील या वास्तूमध्ये शेषशायी विष्णूचे असेच शिल्पांकन दिसते की ज्यात ब्रह्मदेव क्रमशः लहान होत जाऊन सर्वात खालच्या थरातील मूर्तीमध्ये लुप्त झालेला आहे आणि विष्णूनी डोळे पूर्णपणे उघडलेले आहेत. हे शिल्प केवळ उत्तर दक्षिण अशा रचनेत आहे असे नाही तर ते विहिरीच्या गोलाकार अंतर्भागात आहे. अन्य मंदिरात हे शिल्प पूर्व पश्चिम असताना निद्रिस्त विष्णू दाखविण्याचे कारण असे की एकदा हे ब्रह्मांड निर्माण केले की विष्णू परत निद्रिस्त होतो अशी त्याची कल्पना केलेली आहे. विष्णुपुराणात (३.८.१०-१२) असे म्हटले आहे की, ब्रह्मांड निर्माण करण्यापूर्वी विष्णू योगनिद्रेत असतो. त्याची कलाशक्ती जागृत होऊन तो एक हजार महायुगे झोपतो. हा त्याच्या एका निमिषाचा (डोळ्याच्या एका उघडझापीचा) काळ आहे. ज्या वेळेस ह्या सृष्टीचा -हास होतो तेव्हा विष्णू परत जागा होतो. या स्थिती मध्ये अवकाश प्रवाहही होते आणि काळ थांबतो. आधुनिक शास्त्र सांगते की, कृष्णविवरांमध्ये हीच अवस्था येते (आपटे: २००२, पृ. ६२). उत्तर दक्षिण विष्णू झोपलेला असताना सृष्टीचा -हास झालेला आहे म्हणजे सूर्य आता उगवत किंवा मावळत नाही म्हणून विष्णू जागा झालेला दिसतो. विहिरीच्या गोलार्धात हे शिल्प कोरून या ठिकाणी अवकाशाचे अवगुंठन झालेले आहे हे कलाकाराने सूचित केले आणि त्यासाठी एका विवरामध्येच हे शिल्प कोरून त्याने वैज्ञानिक सत्य प्रस्थापित करायचा प्रयत्न केला असावा असे वाटते. संपूर्ण सृष्टीचे सूक्ष्म कणात अवगुंठन झालेले असले तरी त्याही अवस्थेतही श्रीविष्णूचे अस्तित्व असते.
चित्र क्र. ३३ : शेषशायी विष्णु, पाटण
     या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण भिंतीवरील सगळ्यात खालच्या स्तरावर दशावतारांचे सुरेख शिल्पांकन दिसते. उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडील भिंतीवर प्रत्येकी सहा मोठे आणि एक लहान असे बौदा देवकोष्ठ आहेत. उत्तरेकडच्या भिंतीवर डावीकडून पाहताना पहिल्या छोट्या देवकोष्ठात विष्णूचे शिल्प आहे. दुसऱ्यात वीस हातांचा भैरव, तिसरे देवकोष्ठ रिकामे आहे, चौथ्या देवकोष्ठात भूवराहाचे शिल्प आहे, पाचवे रिकामे आहे, सहाव्या देवकोष्ठात वामन आणि शेवटच्या देवकोष्ठात कोदंडधारी रामाचे शिल्प आहे. यातील मत्स्य, कूर्म आणि नृसिंह या अवतारांची शिल्पे दिसत न दशावताराच्या रांगेतील पहिल्या रिकाम्या कोनाड्यात मत्स्य आणि कर्मावताराचे एकत्रित शिल्प असे वाटते. तसेच पाचव्या रिकाम्या देवकोष्ठात नृसिंहाचे शिल्प असावे. नृसिंहाचे शिल्पांकन शिल्पपटामध्ये केलेले दिसते. दक्षिणेकडील भिंतीवर डावीकडून उजवीकडे पाहताना पहिल्या देवकोष्ठात नांगरधारी बलराम दुसऱ्यात परशु धरलेला परशुराम, तिसऱ्यात बुद्धाची उभी मूर्ती, आणि चौथ्यात अश्वारूढ कलीचे शिल्प आहे. त्यानंतरच्या देवकोष्ठात वीस हातांची महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. पुढील कोर मोकळा असून शेवटच्या देवकोष्ठात सूर्याची प्रतिमा आहे.

गुप्तकालीन विष्णु मुर्ती :-

       कलाकारांनाही आश्रयदाते मिळाल्यामुळे त्यांचे ही काम जोरांत सुरू झाले. त्यांनी नवे नवे प्रयोग सुरू केले. आतां शारीरिक सौंदर्याला वरचा दर्जा मिळू लागला. मोजके दागिनें, अलंकृत प्रभामंडल, सुरकुत्या पडलेली तलम वस्त्रे, नाजुक कोरीव काम, परिवार देवतांचा उदय, हसरे पण भरीव चेहरे, निरनिराळ्या प्रकारची केशरचना, वगैरे गुप्तकलेची वैशिष्ट्ये होत. एवढ्या साधारण गोष्टी लक्षात ठेऊन विष्णुमूर्तीत आतां कोणती परिवर्तने प्रामुख्यानें दिसूं लागली याचा थोडक्यात विचार करूं.
१. प्रभामंडळाचा उद्भव :
        दैवी शक्तीचें विशेष तेज किंवा प्रभा जे वर्तुळ दाखवितात त्याला प्रभामंडळ असें ही म्हणतात. कुषाण काळापासून या वैशिष्ट्याचा उदय झाला व बुद्ध, बौधिसत्त्व, तीर्थकर वगैरेच्या प्रतिमांत प्रभामंडळ दिसू लागले. मात्र विष्णुप्रतिमेच्या क्षेत्रांत त्याचा तितकासा प्रवेश झालेला नव्हता व दाखविले तर ते अगदी साधें दाखवीत. गुप्तकालात मात्र प्रभामंडळांकडे लोकांचे जास्त लक्ष वेधले व ते आतां कधी साधे तर कधी मणिमाला, पत्रावली, हारयष्टी, मकर, कमल, वगैरे अनेक अलंकरणानीं नटलेले दिसू लागले (ल.सं.एच्. १११ चित्र ४).
 
 मस्तकाच्या मागे प्रभामंडळ असलेली विष्णु प्रतिमा
२. हातांची ठेवण :
     नुकताच विष्णूंच्या 'उद्द्घाहू' हाताचा उल्लेख केलेला आहे. कुषाण कालांत मागील हात उद्बाहू असून सामान्य हात अनुक्रमें 'अभ्य' व 'कटि अवलंबी' असत. गुप्तकाळांत मागचे हात खाली आले व दोन्ही सामान्य हात देखील दंडांशी जवळ जवळ काटकोन करीत स्थिर झाले. साहाजिक हातांची ही स्थिती 'प्रलम्बबाहू' या नांवानें ओळखली जाऊ लागली. खाली आलेले हे विष्णूंचे हात आयुधं घेऊन तरी असतात किंवा आयुध पुरुषांच्या किंवा आयुधदेवीच्या मस्तकांवर टेकलेले असतात (रे.चि. चौदा १)
 
गुप्तकाळात हाताच्या रचनेत झालेला बदल
 
३. अंकन पद्धतींत परिवर्तन :
      प्रतिमेंचे 'अभयान्मुख अंकन' गुप्तकाळांत फारसे रूढ राहिले नाही. मूर्तीचा दर्शनी भाग सुंदर, आकर्षक व डौलदार घडविण्यांत कलाकार आपले कसब पणांस लावू लागला, पण त्या बरोबरच पृष्ठभागांवरून त्यांने आपलें बरेचसे लक्ष काढून घेतले. तो आतां मागील भाग फक्त पुसट कल्पना येण्यांपुरताच घडवू लागला. याचा परिणाम असा झाला कीं मागच्या बाजूला फक्त प्रभामंडळाचे वाटोळेपण, दंडांची ठेवण व वस्त्राचे संकेतन शिल्लक राहिले (रे.चि. चौदा ३)

 गुप्तकाळात मुर्तीच्या मागील बाजुचे नक्षीकाम कमी झाले

४. दागिनें :
     या क्षेत्रात ही डोळ्यांत भरण्यांसारखे बदल झाले. आता दागिनें अगदी मोजके पण जास्त रेखीव दिसू लागले. विष्णूंच्या दागिन्याचा स्वतंत्र विचार पुढें क्रमानें येणारच आहे.
 
 विष्णु मुर्तीच्या दागिन्याची सुबकता वाढली

आयुधें :

      कुषाण व गुप्त काळांत गदा व चक्रही विष्णूची अत्यंत आवश्यक अशी आयुधे होती. तिसरें आयुध म्हणजे शंख किंवा काही प्रतिमांत दिसणारे जलपात्र (रे. चि. तेरा १) सामान्य उजवा हात अभयमुद्रेत असल्यामुळे तेथे कोणतेही आयुध नसावयाचेच. गुप्तकाळांत हा हातही खाली आल्यामुळे त्यांत फळ किंवा क्वचित घट दिसू लागला. आयुधांचा विचार करीत असताना हे लक्षांत ठेवले पाहिजे कीं कुषाण व गुप्त दोन्हीं काळांत क्वचित अपवाद वगळले तर वरच्या उजव्या हातात गदा, वरच्या डाव्या हातांत चक्र व खालच्या उजव्या हातांत शंख (किंवा जलपात्र) हा क्रम बदललेला नाही.

 शंख, चक्र, तलावार धारण केलेली विष्णु मुर्ती

    या बाबतीत दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे 'कमळा'चा अभाव ही होय. आज जरी विष्णूंची चार आयुधं म्हणजे शंख, चक्र, गदा व पद्म अशी समजूत सर्वत्र रूढ असली तरी गुप्तकाळांपर्यंत ही गोष्ट मुळीच अस्तित्वांत आलेली नव्हती. सहाव्या शतकाच्या पूर्वीची कमळ घेतलेली विष्णुप्रतिमा पाहण्यात येत नाही. समकालीन वाङ्‌मयांतूनही या गोष्टीची पाठपुरवणी होते. वाल्मीकीय रामायण, महाभारत, विष्णुपुराण, वराहपुराण, वायुपुराण, ब्रह्मपुराण, वगैरे अनेक प्रारंभिक ग्रंथांत साधारणपणें विष्णूंचे वर्णन 'शंखचक्रगदाधर' असेच केलेले आढळते. कमळाचे उल्लेख मिळत नाहीतच असे नाही, पण एक तर त्यांचे प्रमाण फार थोडे आहे व बऱ्याच ठिकाणी ते सहाव्या सातव्या शतकांनंतरचे आहेत. हे पटविणारे आधारही बहुतेक त्यांच्या जवळपासच सापडतात. दहाव्या शतकांपर्यंत मात्र पद्माला एक आयुध मानणारी परंपरा दृढमूळ झाली. तिचा विचार पुढें करूं.

गदा :

       कुषाणगदा (रे.चि. सात १, दहा १; तेरा १,५) मुद्गलांसारखी अर्थात् खालून वर निमुळती होत जाणारी आहे. तिच्या वरच्या टोकांवर मूठ लावीत. हिची साधारण उंची पाया पासून डोक्यापर्यंत असल्यामुळे ही मलखांबासारखी दिसते. पुराणात विष्णूच्या गदेचे वर्णन 'वह्निशिखाकारा' व 'प्रदीप्त पावकोज्वला' असे केलेले आढळते. ते कुषाण गदेच्या बरेच जवळ आहे. विष्णूने गदेला सरळ किंवा उलट्या बाजूनेंही धरलेले दिसते.
       गुप्तकालांत गदेच्या आकारांत थोडा बदल झाला. तिची उंची कमी झाली. पण रूंदी अर्थात् पसरटपण वाढला व तिच्या बुडाशी एक बसका गोळा लावला गेला. ज्याला 'कुंभ' किंवा 'आमलक' या नांवाने ओळखतात. कुंभापासून मुठीपर्यंतच्या भागांला दंड म्हणतात. कधीं कधीं हा दंड अष्टपैलू घडवीत असत. (रे.चि. दहा २) या काळांत ही गदा विष्णूंच्या मागच्या उजव्या हातातच अनेक ठिकाणीं दिसते पण त्याबरोबर अपवाद ही आढळतात. विष्णूंच्या गदेला 'कौमोदकी' असें नांव आहे.
पाया पासून डोक्यापर्यंत उंची असलेली मुद्गलांसारखी अर्थात् खालून वर निमुळती होत जाणारी वरच्या टोकांवर मूठ लावलेली कुषाण गदा

चक्र :
       विष्णूंचे दुसरे अनिवार्य आयुध म्हणजे चक्र. ह्याचे नांव 'सुदर्शन'. बहुतेक विष्णूच्या वर उचललेल्या मागच्या डाव्या हातांत उघड्या तळहातांवर अंगठ्याच्या आधारानें चक्र पेललेले असतें च त्याची धाव उरलेल्या चार बोटांनी घरलेली दाखवितात (रे.चि. नऊ १६).
गुप्तकाळांत चक्रांचें स्थान जरी तेच असले तरी तें पहिल्यापेक्षां जास्त सुबक व वजनदार झालेले दिसते. हा वजनदारपणा दर्शविण्याकरिता क्कचित ते सरळ विष्णूच्या हातांत न देतां एका चौथऱ्यावर ठेवलेले दाखवितात व त्यावर विष्णूचा हात टेकलेला असतो.
 
 विष्णू मुर्ती जीचे सुदर्शन जमीनीवर टेकलेले

 शंख :

      विष्णूचा 'पाञ्चजन्य' शंख कमरेशी टेकलेल्या त्याच्या सामान्य डाव्या हातात असतो. कुषाणकालीन बहुतेक शंख वामावर्त असून त्यावर कोणतेही अलंकरण कोरलेले दिसत नाही. शंख विष्णूच्या तळहातांवर उभा, वाकडा किंवा आडवा ठेवलेला असून कधी कधी त्याच्या पोकळींत बोटें अडकवून धरलेला असतो. (रे. चि. नऊ ९-१४) गुप्तकाळांत शंखांत फारसा बदल झालेला दिसत नाही.
 
 हातात शंख धारण केलेली विष्णु मुर्ती

जलपात्र :

      कुषाणकालीन काही विष्णुप्रतिमात शंखाचा पर्याय म्हणून जलपात्र दाखविलेले आहे. अशा प्रकारच्या फक्त सहा प्रतिमा आज मितिपावेतो आपणांस माहीत आहेत. (म.सं. २८.१७२९, ६४.२५२०, (चित्र.२) १५.९४८, १५.९१२, (रे.चि.तेरा १) १५ ९३३ आणि ४७ ३२५८). पाण्याचे हे भांडे मैत्रेय बोधिसत्त्वाच्या हातात दिसणाऱ्या अमृतघटांसारखें म्हणजें उंच गळ्याच्या लांबट गोल बाटलीसारखे दिसतें. ही शंख येण्यांच्या पूर्वीची स्थिती असावी. मथुरेहून मिळालेल्या एका विष्णुप्रतिमेच्या (म.सं.४७ ३२५८) जलपात्रांवर दोन्ही बाजूला अलंकरण म्हणून दोन शंखच काढलेले आहेत!! विष्णूच्या जलपात्रांचे वाङ्‌मयीन उल्लेख मात्र मिळत नाहीत. असें म्हणणें शक्य आहे कीं सुरुवातीला अमृतघटधारी मैत्रेयाच्या मूर्तीस डोळ्यासमोर ठेवून मथुरेच्या पाथरवटांनी विष्णूंच्या हातांत जलपात्र दिलें, पण पुढें समकालीन साहित्यिक परंपरेला प्रमुखता देऊन त्यांनी जलपात्राच्या ऐवजी शंखाची योजना केली.
      गुप्तकाळांत विष्णूच्या हातांत साधारणपणें घट किंवा जलपात्र दिसत नाही, अपवाद म्हणून बंगलोरच्या वस्तुसंग्रहालयांतील एका गुप्तकालीन उत्तरभारतीय मूर्तीकडे बोट दाखवितां येईल, पण तिचा स्वतंत्र विचार पुढे करू.
 
  हाती जलपात्र धारण केलेली विष्णु मुर्ती
फळ :
      कुषाण काळातील अभयमुद्रेत असणारा विष्णूंचा उजवा हात गुप्तकाळांत जेव्हां खाली आला तेव्हां त्यात एक नवी वस्तू दिसू लागली. ते म्हणजे (रे. चि. पंधरा ४, सोळा २) फळ होय. ह्या फळाची नक्की ओळख सांगणे कठिण आहे. पुराणांत त्याला 'चित्रफल' असें म्हटलें आहे.' आकारांवरून व समकालीन इतर मूर्तीचा विचार केल्यानंतर हे बीजपूरक लिंबू किंवा सीताफळांसारखे बऱ्याचश्या बियांनी भरलेले (विविध प्रकारच्या उत्पत्तींचे द्योतक) फळ असावे असा तर्क करतां येतो.
 
 हाती फळ धारण केलेली विष्णु मुर्ती

आयुधपुरुष :
       निरनिराळ्या देवतांच्या आयुधांना स्वतंत्र देवता कल्पित करून मूर्तरूपांत दाखविण्यांची पद्धती गुप्तकाळांत रूढ झाली. मानवरूपें धारण केलेल्या आयुधांना 'आयुधपुरुष' या नांवाने ओळखतात. प्राचीन भारतीय वाङ्मयांत आयुधपुरुषांचे बरेच उल्लेख आढळतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या जन्माची कथा मिळते व अवतारांचेही वर्णन आढळतें. उदाहरणार्थ रामायणकार वाल्मीकी सांगतात की दक्ष प्रजापतीला जया व सुप्रभा नांवाच्या दोन मुली होत्या. त्यांना कृशाश्वांपासून प्रत्येकी ५०० अशी एक हजार मुलें झाली. ही अस्त्रशस्त्रांची स्वरूपें होतीं. पुढे कुशिकाचा मुलगा विश्वामित्र हा राजा झाल्यानंतर ही मंडळी त्याचेजवळ आली व योग्यवेळी ती सर्व विश्वामित्रांकडून रामाला सोपविली गेली. असें सांगताना रामायणकार लिहितात की 'ही सर्व अस्त्रे ऑजळ करून (प्राञ्जलयः) 'किंकर' रूपाने रामाचे समोर आलीं व रामानेही आपल्या हातांने त्यांना जवळ करून (पाणिना समालभ्य) आपल्यात समावून घेतले."

     महाभारतातही आयुधपुरुषांचे उल्लेख आढळतात. 'चक्र मुसल' संग्रामांचे वेळी कृष्ण व बलरामांची शस्त्रे अर्थात् सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, संवर्तक नांगर व सौनंद मुसळ मूर्तिमान होऊन आकाशांतून उतरली विष्णूंप्रमाणेंच शंकराची त्रिशूल, दण्ड वगैरे शस्त्रे मानवरूपानें त्यांचे बरोबर चालत असे अनुशासन पर्वात वर्णन केले आहे.

मुर्तीच्या पायापाशी असलेले आयुध पुरुष

     रामायण महाभारतांच्याच पावलांवर पुढील साहित्यकारांनी पावले टाकली आहेत. उदाहरणार्थ कालिदासानें विष्णूंच्या 'हेति' किंवा आयुधांना चेतन म्हटले आहे." दुसऱ्या ठिकाणी राजा दशरथाच्या राण्यांचे वर्णन करीत असतांना तो असें सांगतो कीं कमळ, खड्ङ्ग, गदा, धनुष्य व चक्रानें 'लांछित' ठेंगू किंवा वामन मूर्ती गर्भार राण्यांचे रक्षण करीत असत." ह्या ठेंगू मूर्ती म्हणजेच शिल्पांत दिसणारे आयुधपुरुष होत. ते आकाराने ठेंगू असून त्याचे पाठीकडे किंवा हांतात त्याचे शस्त्र रूप ओळख किंवा लांछन रूपानें असते.
    शिल्पांत विष्णू, शिव, स्कंद, देवी, इत्यादि बरोबर आयुधपुरुष गुप्तकालांपासून दिसू लागतात. परंतु इतरांपेक्षा विष्णू बरोबर त्यांचे अंकन जास्त प्रमाणांत केले जातें. इतर आयुधांचा विचार योग्य ठिकाणी करू. तूर्त केवळ वैष्णव आयुधांकडे वळणें क्रमप्राप्त आहे.

निरनिराळी आ युधे धारण केलेली  विश्वरूपा श्री विष्णु ( राष्ट्रीय संग्रहालय स्कॉटलैंड  )

        साधारणपणें आयुधपुरुष विष्णूच्या पायांजवळ आजुबाजूला दिसतात व प्रलंबावस्थेत असलेले विष्णूंचे हात त्यांच्या डोक्यावर असतात (र.चि. चौदा १) किंवा क्वचित विष्णूनें त्यांची मान धरलेली असते. देवगढ (झांशी) येथील शेषशायी विष्णूंच्या सुंदर प्रतिमेत खालच्या बाजूला कोरलेले आयुधपुरुष लक्ष देण्यांसारखे आहेत." पाहणाऱ्याच्या उजव्या हातांकडे क्रमाने गदा, चक्र व शंख पुरुष उभे आहेत. चौथा पुरुष खड्गपुरुष आक्रमण करणाऱ्या राक्षसांशी युद्ध करावयांस पुढे पाऊल टाकत आहे. याच्या हातात मूळ आयुध अर्थात् खड्ग आहे (र.चि. नऊ २)
     सामान्यतः गदेला स्त्रीरूपांत दाखवितात व शंख व चक्र ही आयुधे ठेंगू आणि स्थूल अशा पुरुषांचे रूपांत दिसतात. काही ठिकाणी गदा शस्त्राच्या आकाराचीच असते पण तिच्या दर्शनी भागांवर स्त्रीमूर्ती कोरलेली असते. (रे.चि.सात ४, चौदा १)
     जाता जाता हे नमूद करण्यास हरकत नाही की आयुधपुरुषांना क्वचित् जैनांनीही आश्रय दिला होता. राजगीर (बिहार) येथे वैभार पर्वतात मिळालेल्या तीर्थकार नेमिनाथाच्या पायशिळेंवर त्यांचे लांछन म्हणून चक्राला 'चक्रपुरुषा'च्या रूपांत अंकित केले आहे.
    विष्णूंच्या आयुधांचा येथपर्यंत विचार झाला. आतां त्याच्या प्रतिमेत दिसणाऱ्या काही ठळक बाबींकडे लक्ष पुरवू. प्रथम वस्त्र व अलंकार पाहू. 

अधोवस्त्र :
     प्रत्येक कुषाणकालीन विष्णुशिल्पांत नेसूंचे वस्त्र म्हणून धोतर दिसतें. हे काष्टा घालून नेसलेले आहे व पुढचा सोगा जवळ जवळ पायघोळ आहे. मागील बाजूस काष्टा पुरता खोचित नसत, त्याचा थोडासा भाग बाहेर डोकावत राही. ही धोतर नेसण्यांची पद्धत त्या काळांत सर्वसामान्य होती. (चित्र १,२)
कुषाणकालीन विष्णुशिल्प ( धोतराचा सोगा लक्षणीय )

    गुप्तकाळांत रुंद धोतरांबरोबरच अधोवस्त्राचा एक नवा प्रकार रूढ झालेला दिसतो. येथे वस्त्र फार लांडे गुडघ्यापर्यंतचा भाग देखील नीट झाकलेला नसतो. हे वस्त्र म्हणजे पंचावजा लांडे धोतर नसून ही 'जंधिका' किंवा 'अर्धारूक्' या नांवाने ओळखली जाणारी चड्डी असावी.

उपवस्त्र किंवा उपरणें :

     कुषाण किंवा गुप्त काळांत विष्णूंच्या खांद्यावर उपकरणें हवेच असा प्रतिबंध नव्हता. पुष्कळदा तें नसतेच पण असल्यास ते खांद्यावर टाकलेले नसून कमरे भोवती गुंडाळलेले असते. त्याच्या दोन्ही पदरांची डावीकडे एक फुगीर गांठ मारून उरलेले सोगे जमीनीकडे लोंबत असतात. गुप्तकाळांत ही पद्धत थोडी बदलते कारण इतर वस्त्रांबरोबरच या काळातील उपरणें ही बारीक व तलम प्रकारचे दिसते.

मुगुट व मुगुट-बंधन :

     कुषाण काळांपूर्वी मोठे व शिष्ट लोक फुगीर फेटे वापरीत कुषाणकाळांत हे फेटे गेले व त्या ठिकाणीं मागे सोगा सुटलेले व बदामाच्या आकाराचा तुरा असलेले बांधीव फेटे दिसू लागले. या प्रकाराला आपण उष्णींष असे म्हणू, कुषाण विष्णूंच्या डोक्यावर अशा प्रकारचे उष्णीष दिसते (चित्र १).
     या कालाच्या उतरत्या दिवसांत रूढ झालेल्या दुसऱ्या प्रकारांत पुढचा तुरा व मागचा सोगा गुप्त होऊन डोक्यावरचा मुगुट उंच पण बसक्या टोपीसारखा दिसतो. कर्धी ही टोपी साधी असते तर कधीं तिच्यावर फुलांचे भरतकाम करीत व दोन्हीं कानाचे वर मोठीफुलें लावून तिच्या सुबकतेत भर टाकीत (रे.चि. सोळा ३; चित्र २)
   गुप्तकाळांत वरील दोन्हीं प्रकार थोड्या फार फरकानें रूढ होते, पण त्यांना अलंकृत करण्यांच्या पद्धतीत बदल झाला. कुषाण काळातील काही मुगुटांच्या तुऱ्यावर पसरलेला जबडा असलेल्या व पुढच्या पंजात मोत्याची माळा घेतलेल्या सिंहाची आकृती दिसते (रे.चि. एक २). व्यावृत-मुख सिंहांची ही नैसर्गिक आकृती हळुहळू बदलत जाऊन तिचे ठिकाणर्णी 'मुक्तादाम' ओकणारे सिंहमुख किंवा तशाच प्रकारचे कीर्तिमुख दिसू लागते (रे. चि. पंधरा ४). या शिवाय पूर्ण विकसित कमळे, एकाधिक कीर्तिमुखें, चौफुल्या, मगराची तोंडे, वगैरे अनेक अलंकरणाचा उपयोग मूर्तिकाराने आपापल्या आवडीप्रमाणें केलेला दिसतो. (रे.चि. ४)
   मुगुटाच्या वरच्या बसक्या भागांवर देखील एक अधोमुख कमल काढण्यांची पद्धत या काळांत सुरू झाली होती. (चित्र ४ या प्रतिमेच्या मुगुटांवर असें कमळ आहे.)
कुषाणकालीन मुकुट धारण केलेली विष्णु मुर्ती
 
मुगुट डोक्यावर घट्ट बसावा एवढ्यासाठी त्याच्या बाजू दोऱ्यानें दोन्हीकडे आवळीत असत व दोऱ्याची उरलेली टोकें मानेंवर सोडून देत. बऱ्याच प्रतिमांत आवळदोरीची ही टोकें अर्थात मुकुट बंधनें मानेच्या दोन्ही बाजूनें डोकावतांना दिसतात (रे. चि. पंधरा ४).

जानवें :

    कुषाण काळांत जानव्याचा उपयोग सर्रास नव्हता. आजपर्यंत मिळालेल्या फक्त पांच विष्णु-प्रतिमांत (म.सं.१५.९५६, ३४.२४८७ (चित्र १) ३९.२८५८,४९.३५०२ व ५०.३५५०) तें दिसते. याचा आकार साध्या दोऱ्याचा आहे.
   गुप्तकाळांत मात्र जानव्याचा वापर वाढला; पण त्या बरोबरच त्याचे साधे रूप ही लुप्त होऊन मोत्याच्या सरांने तयार केलेला तो एक अलंकार झाला. मोत्यांचे जानवें किंवा 'मुक्तायज्ञोपवीत' याला जणू की काय एका दागिन्यांचे रूप आले (चित्र ४, रे.चि. चौदा१).
जाड दानवे धारण केलेली विष्णु मुर्ती ( कुषाण काळ )

कटिसूत्र : (रे.चि.तेरा ४,५)

    प्राचीन भारतांत धोतरांवरून कमरेभोवती गुंडाळलेली एक अरुंदपट्टी शिष्टसम्मत पोषाखाचें एक आवश्यक अंग मानले जात असे. पाली साहित्यांत या पट्टीला 'कायबंधन' असें म्हटले आहे व विनयपिटकांत तिचे प्रकार ही सांगितले आहेतः कुषाणकालीन विष्णुप्रक्षतमांत कायबंधनांचा उपयोग केलेला दिसतो. यापुढे पट्टीचे स्थान गोंडेदार बारीक दोरी घेते. हेंच 'कटिसूत्र' किंवा आपला कडदोरा अथवा करगोटा होय.
कायबंधन धारण केलेली कुषाणकालीन विष्णु प्रतिमा

   गुप्तकाळांत रेशमाच्या या पीळदार नाजूक दोऱ्यास कटिसूत्रांबरोबरच 'श्रोणिसूत्र' आणि 'नेत्रसूत्र' असेही म्हणू लागले. गुप्तकालीन विष्णू-प्रतिमांत नेत्रसूत्राचे कित्येक सुंदर प्रकार आढळतात (चित्र ४).

अंगद, कंकणें आणि कुण्डलें :

   या दागिन्यांचा वापर कुषाण काळांपासूनच रूढ झाला व पुढेही चालू होता. विष्णूची 'मकरकुण्डले' अजून शिल्प परंपरेंत उगवली नव्हती; पण मणी, चक्र, पुष्प व क्वचित सिंहकुंडलाचाही उपयोग केलेला दिसतो (म.स. ३४.२५२५, ल.सं. एच्. १११, बंगलोरचा धनवंतरि).
वैशिष्ट्यपुर्ण कुंडले आणि एकावली धारण केलेली विष्णु प्रतिमा

दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक)

a

एकावली :
   टपोऱ्या मोत्यांचा किंवा मण्यांचा एकच सर किंवा एकावली गुप्तकाळांतील आवडता दागिना होता. यातील मधला मणी सगळ्यांत मोठा असून आजुबाजूचे क्रमाने लहान आकाराचे दिसतात. कधी या दागिन्याला एकाऐवजी एकाच खोडांत पटवलेले दोन पदर असतात (ल.सं.एच्. ११०, एच्. १११).
हारयष्टी :
    गुप्तकाळांतील विष्णूचा दुसरा दागिना म्हणजे मोत्यांचे किंवा मण्यांचे एकाधिक पदर एकत्र गुंफून तयार केलेला 'हारयष्टी' नांवाचा जाडजूड दागिना! यांत रत्नांचाही वापर करीत असावेत

वनमाला :
    विष्णूंच्या 'वनमाली' या नांवांवरून त्याचे वनमालेशी किती जवळचें नातें होते हे दिसतें. वन्यपुष्पांची माळा ती वनमाला असा या शब्दाचा सोपा अर्थ आहे. कुषाण काळांत ती तशीच तयार करीत. तिचे पहिले व जास्त लोकप्रिय रूप म्हणजे कदंब, कमळ, वगैरे फुलें, इतर पार्ने व कळ्या ओवून तयार केलेली आखुड माळा (म.सं.२९.२००२, २८.१७२९, ४९.३५०२ रे. चि. सतरा ४). दुसरें रूप ही आकारानें लहानच असते. पण त्यांत फुलांचा भरणा जास्त असून घोसांसाठी पानांचा व मोठाल्या फुलांचा उपयोग केलेला आढळतो (म.सं. १५.९५६). तिसरा प्रकार म्हणजे गुडघ्यांपर्यंत रूळणारी लांब वनमाला. ही पद्धत गुप्तकाळांत फारच लोकप्रिय झाली. आता वनमालेचे जुनें नैसर्गिक रूप जाऊन तिने फुलांचा दाट हार किंवा गजऱ्याचे गोंडस रूप घेतले व ती विष्णूच्या कंठाच्या बाजूंनी प्रगट होऊन दोन्हीं दंडावरून वळसे घेत गुडघ्यांपर्यंत रूळू लागली (चित्र ४, रे. चि. सतरा ८).
वनमाला धारण केलेली विष्णु मुर्ती

श्रीवत्स व कौत्सुभ :
   वाङ्मयीन परंपरेंत आढळणारी विष्णूंची ही दोन्ही चिन्हे कुषाणकालीन मूर्तीत क्वचित अपवाद वगळल्यास दिसत नाहीत. श्रीवत्साचा कुषाणकाळांत बराच वापर होता पण शिल्प परंपरेंत विष्णूंशी त्याचा संबंध स्थिर झालेला नव्हता. 'श्रीवत्स' हे एक नैसर्गिक चिन्ह होते अथवा गळ्यांतील दागिन्याचे ते एक विशिष्ट आकारांचे पदक होते हे निश्चित सांगता येत नाही. हरिवंशकारांच्या मतांप्रमाणें वक्षस्थलांवरील रोमांनी निर्मित झालेली ती एक नैसर्गिक आकृती होती. या उलट काही प्रतिमांत ते कंठाभूषणांच्या पदकांप्रमाणेंच वापरलेलें दिसते. (उदयगिरी, विदिशा येथील विष्णु; रा. सं. नवी दिल्ली येथील गुप्तकालीन विष्णु) सरासरी गुप्तकाळांपर्यंत विष्णुशिल्पांत श्रीवत्साचा अनिवार्य असा उपयोग झालेला दिसत नाही. महाभारतांप्रमाणें श्रीवत्स हे मूलतः 'त्रिशूल चिह्न' असून विष्णूने शंकराच्या मैत्रीस्तव ते हृदयांवर धारण केले होते.
       आतां कौस्तुभांकडे वळू. पौराणिक कथेंप्रमाणें हे रत्न समुद्रमंथनाच्यावेळी प्रगट झाले व ते विष्णूला मिळाले. याच्या आकारादि बद्दल विशेष माहिती नसल्याने शिल्पांत त्याची नक्की ओळख पटणें कठिण आहे.

 विष्णु-शिल्पांचे वर्गीकरण

अभ्यासाच्या दृष्टीने वैखानसगमानें"' केलेले विष्णुशिल्पांचे वर्गीकरण बरेच सोयीचे आहे. ते असें -

वैष्णव ध्रुवबेर (अचलमूर्ती)
स्थानक
आसन
शयन
(उभी)
(बसलेली)
(आडवी किंवा निजलेली)

प्रत्येकांचे ४ प्रकार
- योग (उदा. योगस्थानक)
- भोग (उदा. भोगासन)
- वीर (उदा. वीरशयन)
- आभिचारिक (उदा. अभिचारिक स्थानक)
    मुळांत वैखानसागम हा दक्षिणभारतांत तयार झालेला असून तो गुप्तोत्तर कालांतील असावा, पण त्यांत वर्णन केलेल्या परंपरेचे आधार मात्र जुनें असले पाहिजेत.
   वरील वर्गीकरणांत उल्लेशिलेल्या तिन्हीं प्रकारच्या प्रतिमा मिळतात. पण खालील उपप्रकारांत आभिचारिक स्थानक, अभिचारिक आसन व आभिचारिक शयन प्रकारांच्या मूर्ती सहसा आढळत नाहीत.

स्थानक मूर्ती :
    इतर प्रकारांपेक्षा उभ्या अर्थात् स्थानक मूर्तीची संख्या जास्त आहे. आपणांस आजपर्यंत माहीत असलेल्या स्थानक प्रतिमा खालील प्रकाराच्या आहेत.
१) चतुर्भुज
२) द्विभुज
३) अष्टभुज
४) चतुर्व्यह
५)पञ्चवीर
६) वैकुंठ
७) विश्वरूप
८) अनंत
९) हरिहर
१०) काही अवतार मूर्ती
आसनमूर्ती :
  या प्रकारांत चतुर्भुज विष्णू, गरुडारूढ विष्णू, विश्वरूप तसेच हयग्रीव, नरसिंह, करिवरद, मधुकैटभारि, इत्यादि प्रकाराच्या अवतार प्रतिमांचा समावेश होतो.

शयनमूती :

   या वर्गाची फक्त एकच प्रकारची प्रतिमा म्हणजे शेषावर झोपलेला विष्णू आपणांस आढळतो.
आतां या सर्व उपप्रकारांची किंचित विस्तारांने पाहणी करू.

चतुर्भुज स्थानक मूर्ती : (चित्रे १,३,४)

     आयुधांची पकड, दागिन्यांचा व वस्त्रांचा किंचित बदल, प्रभामंडळाची स्थिती, वगैरे बारीक तपशिलात न शिरल्यास या वर्गाच्या प्रतिमा साधारणपणें एकाच प्रकाराच्या आहेत. कुषाण काळांतील मूर्ती 'उद्बाहू' आहेत (रे.चि. दहा १). गुप्तकाळांत त्या 'प्रलंबबाहू' होतात (रे. चि. दहा २). गदा, चक्र व शंख या आयुधांची स्थानें बहवंशी निश्चित आहेत व अजून आयुधांपुरुषांना वगळल्यास इतर परिवार देवतांची ही गर्दी झालेली दिसत नाही.
चतुर्भुज स्थानक मूर्ती

द्विभुज स्थानक मूर्ती : (र.चि. पंधरा १)

    द्विभुज विष्णूमूर्तीची संख्या फारच मोजकी आहे." या प्रकारचे उल्लेखनीय शिल्प म्हणजे ग्वाल्हेर संग्रहालयांत असलेली व विदिशेहून हाती आलेली उभयोन्मुख विष्णूची प्रतिमा. येथें जवळ जवळ एकाच प्रकारच्या दोन प्रतिमा पाठीशी पाठ लावून घडविलेल्या आहेत. श्री गर्दे यांनी हिला सूर्यप्रतिमा म्हटले आहे, पण  हा महत्त्वपूर्ण असा दोन हातांचा विष्णू आहे. कारण -
१) इ. सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकांपासूनच विदिशा हे वैष्णवाचे एक केंद्र होते पण सौरांचा तेथें संबंध असावा असें वाटत नाही. येथें कमीतकमी दोन विष्णू मंदिरे व गरुडध्वज तरी नक्कीच होते. ग्रीकांसारख्या बाहेरच्या लोकांचाही येथील वैष्णवांशी संबंध होता.
२) वस्त्रांची पद्धत, भावभंगिमा, मुगुटांबाहेर अलगद डोकावणारे बारीक केस, दागिन्यांची ठेवण वर उचलेला उजवा व कमरेवर ठेवलेला डावा हात वगैरे बाबतीत ही प्रतिमा मथुरेच्या कुषाणकालीन विष्णूमूर्तीशी फार जवळ आहे.
३) वाङ्मयांत द्विभुज विष्णूंचे उल्लेख मिळतात.
४) येथें सूर्याचे कोणतेही लक्षण यथा पायांतील जोडे, सुरा किंवा कमळ, रथ वगैरे दिसत नाही. शिवाय या मूर्तीच्या कालांपर्यंत (अर्थात् इ.स.च्या पहिल्या दोन शतकांत) सूर्य प्रतिमेचे इतके जास्त भारतीयकरण झालेले नव्हते.
द्विभुज स्थानक मूर्ती

अष्टभुज स्थानक मूर्ती : (चित्र ५)

    कुषाण काळांतील अष्टभुज विष्णूंच्या तीन प्रतिमा आपणांस ज्ञात आहेत (म.सं. १५.१०१०, ५०.३५५० (चित्र ५) ल.सं. ४९.२४७). या सर्वच थोड्या फार खंडित असल्या तरी एकाच परंपरेंत घडलेल्या आहेत. यांत बाण, तलवार व शंख ही आयुधे सर्व सामान्य असून विष्णूंचा उजवा हात त्याच्या छातीवर आहे.' वर उचलेल्या एका डाव्या हातांत कातळे असलेला डोंगर असावा. ह्या डोंगरांचे किंवा तत्सम वस्तूचे धागेदोरे वाङ्‌मयांत आढळत नाहीत, पण कदाचित हे घोर अंधारांचे प्रतीक असू शकते ज्याला हरिवंशाप्रमाणें अष्टभुज विष्णूनें वर उचलून फेकले होते."
     अष्टभुज विष्णूंचे पूजन इसवीसनाच्या सुरुवातीच्या शतकांत दक्षिणेतही रूढ होते हे नागार्जुनीकोंड येथे मिळालेल्या एका शिलालेखाने सिद्ध होते. वसुषेणाच्या या लेखांत 'अष्टभुजस्वामी'चा उल्लेख आहे.''
   गुप्त काळांतील अष्टभुज मूर्तीचा प्रकार फारच कमी झाला होता. कानपुर येथील भीतरगांवच्या इष्टिका मंदिरांवर अशाच प्रकारची एक मूर्ती आढळते पण ती फारच तुटलेली आहे. याच काळांत अष्टभुज प्रकारची 'विश्वरूप' व 'त्रिविक्रम' मूर्तीशी ही संगति झाली. तिचा विचार पुढे करू. (तुलना करा. रे.चि. पंधरा ३)
   साहित्यांत अष्टभुज विष्णूंचे उल्लेख ब्रह्मपुराण, हरिवंश, विष्णुधर्मोत्तरपुराण, बृहत्संहिता, वगैरे ठिकाणी आढळतात. हरिवंशाप्रमाणे विष्णूंचा अवतार वृत्रवधानंतर झालेल्या 'तारकामय संग्रामांत' देवांना कालनेमी, वगैरे राक्षसांविरूद्ध विजयी करण्यांकरितां कृतयुगांत झाला होता."
अष्टभुज स्थानक मूर्ती

चतुर्व्यह विष्णू : (चित्र ६, रे. चि. सोळा३)

   अशा प्रकारची एकमेव प्रतिमा (म.सं. १४.३९२-९५) आपणांस माहित आहे, पूर्वी हिला 'इंद्र' म्हणून ओळखत; पण आतां तिच्या गदेचा भाग हाती आल्यामुळे तो चतुर्यूह विष्णूच होय असे दृढ विधान करता येते. येथे मुख्य प्रतिमा शंख-चक्र-गदाधारी वासुदेवाची असून त्याच्या उजव्या खांद्यातून मद्याचा पेला घेतलेला सर्पाने मंडित संकर्षण उद्भूत झालेला आहे. डाव्या खांद्यातून निघालेली मूर्ती आतां अगदीच तुटली आहे व डोक्यांकडून वर आलेली चौथी प्रतिमा ही खंडित आहे, पण तिच्या डाव्या हातांत तलवार असून उजवा हात अभयमुद्रेत असावा असा कयास बांधता येतो. तलवार हे अनिरुद्धाचे आयुध आहे. अर्थात् डोक्याकडील मूर्ती अनिरुद्धाची व संपूर्ण खंडित चौथी प्रद्युम्नाची असावी हे उघड आहे.
चतुर्व्यह विष्णू
 
   मथुरेंकडे प्रचलित असलेल्या व सात्त्वत, भागवत, वगैरे नांवाने ओळखल्या जाणाऱ्या पाञ्चरात्र मतांप्रमाणें वासुदेव या नांवाने महाविष्णूची प्रामुख्याने कल्पना केलेली असून प्रद्युम्न, अनिरुद्ध व संकर्षण ही त्याची क्रमानें सृष्टी, स्थिती आणि लय करणारी स्वरूपें होत अशी सर्वमान्य मांडणी आहे. वासुदेवांसह यांना 'चतुर्यूह' अशी संज्ञा प्राप्त आहे. इतरत्र हीच नांवे कृष्ण, त्याचा भाऊ बलराम, मुलगा प्रद्युम्न व नातू अनिरूद्ध या रूपांत ओळखली जातात.
   विष्णुकरितां 'विष्णुस्मृतींत आढळणारा 'एकव्यूहश्चतुर्वक्त्रः' हा प्रयोग एकाच व्यूहांतून निरनिराळे आका किंवा मुखें निस्तृत होतांना दाखविणाऱ्या प्रतिमांशी संबंधित असावा.

पञ्चवीर : (चित्र ७)

    वर उल्लेख केलेल्या वासुदेव (कृष्ण), संकर्षण (बलराम), प्रद्युम्न व अनिरूद्ध या व्यूहरूपांचे पौराणिक कालांत यादव वीरांच्या रूपांत वर्णन केले गेले. यांचेबरोबर जाम्बवतीपासून कृष्णाला झालेला मुलगा सांब याचेही नांव घालून एकंदर वृष्णिवंशाच्या पांच वीरांचा 'पंचवीर' या नांवाने एक गट निर्माण झाला व याची पूजाही होऊ लागली. मथुरेहन मिळालेल्या महाक्षत्रप षोडाण याच्या एका स्तंभ लेखांत वृष्णिपंचवीर यांच्या प्रतिमा व त्यांच्याकरितां बांधलेल्या 'देवगृहाचा' उल्लेख आहे. याप्रतिमा अजून निश्चयात्मकरूपानें ओळखता आलेल्या नाहीत.
पंचवीर मुर्ती पट

      जवळ जवळ याच काळांत पञ्चवीरपूजेचे लोण दक्षिणेंतही पोचले होते. आंध्रप्रदेशांतील कोण्डामोतू गावांत मिळालेल्या एका शिळापट्टांवर (चित्र ७) डावीकडून ज्येष्ठता क्रमानें बलराम, कृष्ण, प्रद्युम्न, सांब व अनिरूद्ध यांना त्यांच्या आयुधांसह अंकित केले आहे." डाव्या हातांत शंख घेऊन अभय मुद्रेत उभ्या असलेल्या कृष्णानंतर सिंहरूपांत बसलेला नरसिंहही दाखविला आहे. पण वृष्णिवीरांचा व नरसिंहाचा काय संबंध असावा हे मात्र तूर्त सांगता येत नाही. 

वैकुण्ठ : (र. चि. चौदा १,४) :-

     वर उल्लेखिलेल्या 'एकव्यूहश्चतुर्वक्त्रः' मूर्तीचा दुसरा प्रकार म्हणजे चतुर्भुज विष्णूंच्या तीन किंवा प्रसंगी चार तोंडे असलेल्या प्रतिमा होत. यांत मुख्य मुख मानवाचे अर्थात वासुदेवाचे असून डावीकडील तोंड सिंहाचे व उजवीकडील वराहाचे असते (चित्र ९). कचित या दोन्ही मुखांचा क्रम उलटतो. (रे. चि. चौदा१) चौथे मुख गुप्तकाळांत दिसत नाही, मात्र कधी कधी वासुदेवाच्या मुखांवर अश्वमुख असलेली आवक्षमूर्ती दिसते. वाङ्मयाचा आधार घेऊन असे सिद्ध करतां येते की सिंह हा संकर्षणांचे वराह प्रद्युम्नाचे व अश्वमुख पुरुष अनिरूद्धाचे प्रतीक मानले जात असे." सिंह, मानव व वराह मुखें असलेल्या अशा प्रतिमा 'वैकुण्ठ' या नांवाने ओळखल्या जातात. यांचा प्रचार कुषाण काळांत असावा असे दिसत नाही. मथुरेच्या गुप्तकर्लेत त्याचा उदय झाला व पुढे त्यांनी संपूर्ण उत्तर हिंदुस्थान व्यापिले. हे कथासूत्र पुढे येईलच. गुप्तकाळांत वैकुण्ठ मूर्तीच्या हातांची संख्या साधारणपणे फारच कमी होती. मात्र ती पुढे वाढली.

वैकुंठ विष्णु
     गुप्तकाळांतही 'वैकुंठा'चा बराच प्रचार असला पाहिजे. विष्णुधर्मोत्तर पुराणांत त्याचे विस्तृत वर्णन मिळते.** त्याप्रमाणें वैकुण्ठाला मनुष्य, वराह, कपिल किंवा स्त्री अशी चार तोंडे असून हात मात्र आठ असतात. ही मुखें क्रमानें ज्ञान, शक्ती, ऐश्वर्य व बल या गुणांचे प्रतिनिधित्व करतात.

विश्वरूप : (चित्र ८)

      विष्णूंचे सर्वश्रेष्ठत्व दाखविणाऱ्या या रूपांची अर्थात् विराटरूपाची मूळ कल्पना पुरुषसूक्ताच्या रूपाने ऋग्वेदात आढळते. मूर्तिशास्त्रांत 'एकव्यूहश्चतुर्वक्त्र' विष्णूंच्या प्रभामण्डलांत व उरलेल्या बाकी जागेतही ग्रह, ऋषी, दिक्पाल, गंधर्व, वगैरेचे गट अंकित करून, विष्णूंचे श्रेष्ठत्व दाखवितात. दुसऱ्या शब्दांत हा प्रकार म्हणजे वैकुंठरूपाचीच वाढवलेली आवृत्ती होय असेही म्हणता येईल. येथे मुखें वैकुण्ठाचीच असतात पण प्रभामंडळातील देवगणांची व विष्णूंच्या हातांच्या संख्येत मात्र चांगलीच वाढ झालेली दिसते.
     विश्वरूपाच्या प्रतिमेंचा श्रीगणेश कदाचित कुषाण काळांतच झाला असावा असे भारतकला भवन वाराणसी येथे असलेल्या एका खंडित प्रतिमेच्या आधारांवर म्हणता येते. पण या प्रतिमेत फक्त प्रभावळीचाच एक भाग उरलेला असल्यामुळे मूळ मूर्तीविषयी काहीच सांगता येत नाही.

विश्वरूप  विष्णूं

   गुप्तकाळांत मात्र विश्वरूपाच्या प्रतिमांचे दोन प्रकार दृष्टोत्त्पत्तींस पडतात. प्रथम प्रकारच्या तीन मूर्ती (म.सं.४२- ४३.२९८९); ल.सं.बी २२३; ल.सं.जे. ६८३ सी) पूर्ण किंवा खंडित रूपांत मिळालेल्या आहेत. मथुरेच्या शिल्पांत विष्णूंची तीन मुखें, देवमंडळाने भरलेली प्रभावळ व तिच्या सभोवताल असलेली रुद्रमुखपंक्ती एवढेच दिसते. (चित्र ८) मात्र तूर्त लखनऊ संग्रहालयांत असलेल्या व गढवा येथून मिळालेल्या एका तोरण शिळेवर विश्वरूप विष्णूंचे लहानसे मंदिर दाखविले आहे. तेथे देवपूजन करण्यांकरिता राजा आपल्या लवाजम्यासह आलेला आहे या विश्वरूप मूर्तीची खालील वैशिष्ठों लक्षात घेण्यासारखी आहेतः
१) प्रभामंडळात रुद्रमुखपंक्ती व सभोवर पसरलेल्या ज्वाला आहेत.
२) उजवीकडे सिंह, डावीकडे वराह व मधे मानव मुख असून डोक्यावर अश्वमुख अनिरुद्ध दिसत आहे.
३) विश्वरूपाला सहा हात आहेत व पायांजवळ आयुध पुरुष दिसतात.
४) गळ्यांत आपादलाम्बिनी वनमाला आहे.
विश्वरूप विष्णूंचे वर्णन भगवद्‌गीतेच्या अकराव्या अध्यायांत, अग्निपुराणात व इतरत्र आढळतें.
विश्वरूपाचा दुसरा प्रकार उत्तर गुजराथेतील शामळाजी येथून मिळाला आहे, पण ही आसनमूर्ती असल्यामुळे तिचा विचार त्या सदराखाली करू.

अनंत :

     अनंत शब्दानें विष्णू व शेष या दोघांचाही बोध होतो. या दोघांच्या एकरूपतेलाही बऱ्याच ठिकाणीं मान्यता आहे. काही ग्रंथात व शिल्पांत शेषावतार बलरामालाच विष्णूचा आठवा अवतार मानला आहे. अशीच एकरूपता मूर्तिशास्त्रांत ही आढळते. काही विष्णुमूर्तीत चतुर्भुज विष्णूंच्या मस्तकांवर सर्पकणां व पाठीकडे सर्वांचा वेटोळीदार आभोग स्पष्ट दिसतो. याला अनंत म्हणता येईल. अशा प्रकारची गुप्तकालीन मूर्ती देवगढ, येथे मिळाली आहे." दुसरी अल्हाबादच्या वस्तुसंग्रहालयात आहे (सं.सं. २१२), अनंताची द्विभुज प्रतिमा भीतरगाव (कानपूर) येथे इष्टिका मंदिरांवर आहे".
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bd/Deogarh%2C_Dasavatara-Tempel_Vishnu_%281999%29_%28cropped%29.JPG/800px-Deogarh%2C_Dasavatara-Tempel_Vishnu_%281999%29_%28cropped%29.JPG
अनंतशयन विष्णु, गुप्त काल, देवगढ़, मध्य प्रदेश (स्रोत: अर्नोल्ड बेटेन)

     विष्णुधर्मोत्तर पुराणांच्या 'शेषोपभोगविष्टस्य शून्यं करचतुष्टयम्' या श्लोकार्थात अनंताचे वर्णन आहे."
    देवगढ (जि. ललितपुर) उत्तरप्रदेश येथील गुप्तकालीन दशावतार मंदिराच्या गर्भगृहाच्या दारावर सर्पाच्या वेटीळीवर बसलेला अनंत दिसतो. डोकीवर सर्पाच्या सात फणा असून उजवा हात अभय मुद्रेत, डावा मांडीवर आणि वर उचलेल्या हातांत चक्र व शंख आहे. विशेष म्हणजे देवाच्या उजव्या बाजूला हात जोडलेला नरसिंह आणि डाव्या बाजूला वक्रदंड घेतलेला बुटका वामन दिसतो. या दोघांच्या उपस्थितीचे कारण मात्र सांगता येत नाही. (रे.चि.वि.३).
J. Harle, Gupta Sculptures, 1974, Fig. 105

हरिहर :-

    शैव आणि वैष्णव या दोन संप्रदायांत वेळोवेळी द्वंद्वे माजली व ती मिटविण्यांचे ही प्रयत्न निरनिराळ्या क्षेत्रांत केले गेले. मूर्तिशास्त्रांतील तसा एक प्रयत्न म्हणजे हरि आणि हराची संयुक्त प्रतिमा घडविणें हा होय. याच्या पाठीमागें जी विचारांची बैठक होती तिचा पुरता आढावा पुढें शिवाचे विवेचन करतांना घेऊ. तूर्त एवढेंच लिहून पुढे जातो की अशा प्रकारच्या एकाच मूर्तीत उजवीकडे शिव व डावीकडे विष्णू असतो, व त्या व्यवस्थेला अनुलक्षूनच केश, वस्त्रे, दागिने, आयुधं, वगैरेची रचना करतात. 

हरिहराच्या मूर्ती 
 
हरिहराच्या मूर्ती कुषाणकाळांपासून घडवीत असत. जवळ जवळ इसवीसनांच्या तिसऱ्या शतकांतील काही हरिहर प्रतिमाची मधुरेहून मिळालेली मस्तकें, मधुरा वाराणसी व लखनऊच्या संग्रहालयांत आहेत. (म.सं.सं. १७.१३३३, १७.१३३६ ल.सं.सं.जे. २१३०) जवळ जवळ या काळातील एक बरीच मोठी प्रतिमा विदिशेहून मिळाली असून ती तूर्त दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयांत आहे. ही ऊर्ध्वलिंगावस्थेत आहे (चित्र ५६)
    थोड्या नंतरची हरिहर प्रतिमा पटना संग्रहालयांत (सं.सं. ६००८) आहे. येथे हरिहर पुनः ऊर्ध्वलिंगी असून उजवी कडील हातांत त्रिशूल (खंडित) व माळा तसेंच डावीकडे शंख आहे, दुसरा डावा हात चक्रपुरुषाच्या डोक्यावर आहे.
   गुप्तकालीन हरिहर अलाहाबादच्या संग्रहालयात असून (सं.सं. २९२) येथें पायाशी त्रिशूलपुरुष व चक्रपुरुष दिसतात. त्याचप्रमाणें थोड्या पुढची पण कलेच्या दृष्टीने उत्कृष्ट अशी सर्वांगसुंदर प्रतिमा कलकत्त्याच्या बिरला अकादमी संग्रहालयांत आहे. येथे ही ऊर्ध्वलिंग, शिवाची माळा व त्रिशूल, विष्णूचे चक्र आणि शंख, शिवाचा अर्धचंद्र व व्याघ्रांबर आणि विष्णूचा सिंहमुखांकित मुगुट दर्शनीय आहेत.

चतुर्भुज आसन मूर्ती :
    स्थानकांपेक्षा आसनमूर्तीची संख्या बरीच लहान आहे. विष्णूंची फक्त एकच कुषाणकालीन आसनमूर्ती  पाहण्यांत आली आहे (म.सं.सं.३९.२८५८). आसनमूर्तीच्या सदरात येणाऱ्या काही ठळक प्रतिमा खालीलप्रमाणें सांगता येतील.

गरुडारूढ विष्णू :
    कुषाण काळांतील गरुडावर बसलेल्या विष्णूची मूर्ती दुर्मिळ आहे. अपवाद म्हणून मथुरेच्या संग्रहालयांत सुमारे दोन इंच आकाराची अशा प्रकारची एक प्रतिमा आहे. (म.सं.५६.४२००) पण ती देखील कुषाण व गुप्तकाळांच्या मधली आहे. येथे गरुड पक्षीरूपात असून त्याचे पंख पसरलेले आहेत (विततपक्ष) व त्यांचे पाठीवर चतुर्भुज विष्णु बसलेला आहे.
गरुडारूढ विष्णू 

    गुप्तकाळांत हा प्रकार वाढीस लागलेला दिसतो. हळुहळु मूर्तिकलेत गरुडाच्या रूपांत बदल होऊ लागला. त्याच्या मूळ रूपांत अर्थात् पक्ष्याच्या आकारात मनुष्याचे अवयव प्रगट होऊ लागले. काही ठिकाणीं तो सपक्षमानव झालेला दिसतो. उदाहरण म्हणून देवगढ़ व भीतरगाव येथील गरुडारूढ विष्णुमूर्तीकडे बोट दाखविता येईल.

विश्वरूप :
    विश्वरूपाच्या स्थानक प्रतिमेचा उल्लेख मागे आलेलाच आहे. या प्रकारच्या आसन प्रतिमा उत्तर गुजराथच्या शामळाजी या स्थांनावर मिळाल्या आहेत. येथे सर्पाचा आभोगांवर अष्टभुज विष्णू समोर पाय सोडून बसला आहे. तो त्रिमुख आहे, पण तिन्ही तोंडे मानवांचीच आहेत. मुख्य मुखांच्या मागे एकावर एक अशा मानवमूर्ती शिव आणि ब्रह्मा दिसतात. प्रभावळीत बऱ्याच देवांच्या आकृती कोरलेल्या दिसतात.
  विश्वरूपाच्या या प्रकारासंबंधी वाङ्‌मयीन उल्लेख अजून आढळलेले नाहीत.
 Lord Vishnu sitting on Sheshanaga
 
नरनारायण :
   ऋग्वेदांच्या 'इंद्राविष्णूत' नरनारायणांचे मूळ आहे हे मार्गेच सांगून झाले आहे. हीच जोडी पाणिनीच्या काळांत 'वासुदेवार्जुन' या नावाने प्रसिद्ध होती ऋग्वेदाच्या पावलांवर पाऊल टाकून महाभारतकारांनी नरनारायणांचे बरेच वर्णन केले आहे. एवढेच नव्हे तर त्याचा पहिला नमस्कारच नारायण आणि नराला आहे (नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्). स्वायंभुव मन्वन्तराच्या सत्ययुगांत वासुदेवानेच नराचाही अवतार घेतला होता. नरनारायणाचे शिवाशी व दंभोद्भव नावांच्या राजाशी युद्ध झाले होते, पुढे हे दोघे बद्रिकाश्रमांत तपश्चर्या करीत असत, असे उल्लेख महाभारतात सापडतात. इतर पुराणांतही यांचा उल्लेख आढळतो.
नर नारायण शिल्पपट
 द्विभुज विष्णु आसन मुर्ती
 
    नरनारायणाच्या प्रतिमा कुषाणकाळांत होत्या असें आज तरी सांगता येत नाही. गुप्त काळातही अशा प्रकारच्या जास्त मूर्ती माहीत नसल्या तरी देवगढचा नरनारायण फलक मात्र अवश्य उल्लेखनीय आहे. येथे झाडाखाली तप करणारे नर व नारायण आसनांवर बसलेले आहेत. नारायण चौहाताचा असून नर हा मात्र द्विभुज आहे. जलपात्र, माळा, वगैरे तपस्व्याला शोभणाऱ्या वस्तू त्यांचे जवळ आहे. त्यांनी षड्रिपूंचा पराभव केलेला आहेत याचेंच जणू की काय द्योतक म्हणून त्यांचे पायाजवळ हरिण व सिंह एकत्र दाखविले आहेत.
भीतरगावच्या मृफलकांवर देखील एका ठिकाणी नरनारायणांचेच अंकन असावे असे मानतात.
शयनमूर्ती-शेषशायी विष्णू :
   शेषनांगावर झोपलेला विष्णूला शेषशायिन्, अनन्तशायिन्, जलशायिन् वगैरे नावाने ओळखतात. अशा प्रकारची कुषाण कालीन प्रतिमा मिळालेली नांही, पण गुप्तकालांत मात्र ती दिसू लागते. या कालांतील तिचा एक उत्कृष्ट नमूना देवगढ येथे आहे. चतुर्भुज विष्णू शेषपर्यकांवर डावा हात उशाला घेऊन निजला आहे. कमलावर ब्रह्मदेव आहे, पण हे कमल झोपलेल्या विष्णूंच्या बेंबीपासून निघालेले नाही. पायाशी लक्ष्मी आहे व वरच्या बाजूला स्कंद, इंद्र, शिव, वगैरे देवगण दिसत आहेत. शेषांच्या खाली गदा घेतलेल्या मधु व कैटभांवर विष्णूचा खड्गपुरुष आक्रमण करीत आहे. त्यामागें इतर आयुधें मानवरूपांत उभी आहेत. गुप्तकालीन शेषशायी विष्णूंची खालील वैशिष्ट्ये लक्षांत ठेवण्यांसारखी आहेत :
१) विष्णूच्या हातात कोणतेही आयुध नाही. पुढच्या काळांत ही स्थिती पालटते.
२) शेषाच्या शरीराचे वळसे आडव्या ठेवलेल्या स्प्रिंगसारखे दिसतात, इतरत्र त्यांच्या रचनेंत फरक आढळतो.
शेषशायीचा एक निराळा प्रकार भीतरगाव येथील इष्टिका मंदिरांवर लावलेला होता. तो आज कलकत्याच्या संग्रहालयांत सुरक्षित आहे. (रे. चित्र. ६) येथे द्विभुज विष्णू शेषावर झोपलेला नसून जवळ जवळ रेलून बसला आहे. हातात आयुधं नाहीत व लक्ष्मीचाही पत्ता नाही मात्र मधुकैटभ व नाभीपासून निघालेल्या कमळावर बसलेला एक मुखाचा दाढी असलेला ब्रह्मदेव हे दिसतात. (053-36.38)


    शेषशायी प्रतिमेंच्या मागील विचारसरणी अशी कीं विष्णू हा क्षीर समुद्रांत शेषांवर शयन करतो व लक्ष्मी त्याचे पादसंवाहन करीत असते. वायुपुराणांत" ह्या काळाला 'एकार्णव' स्थिती अर्थात जलप्रलयाची स्थिती असें म्हटले आहे. येथेच सहज खेळ म्हणून विष्णूने आपल्या बेंबीतून शंभर योजनें लांबरुंद असें 'वज्रदंड' कमळ उत्पन्न केले. त्यावर ब्रह्मदेव आसीन झाला. त्यानें तेथें तपश्चर्या केली व पुढे नवीन सृष्टीला सुरुवात झाली. विष्णू सुप्तावस्थेत असतांना मधु व कैटभ या नावांचे दोन महादैत्य ब्रह्मदेवाकडूनच बळ मिळवते झाले व पुढे त्यांच्या भीतीनें ब्रह्मदेव विष्णूच्या नाभिकमलांत जाऊन दडला. या दोघांनी त्याचा पिच्छा पुरवला व विष्णूला त्यांचा संहार करावा लागला. हीच पात्रे शेषशायी प्रतिमेंत अंकित असतात.


विष्णूच्या विभव किंवा अवतार प्रतिमा :

     पृथ्वीवर वेळोवळीं उत्पन्न झालेल्या अवांछनीय तत्त्वांचा संहार करून धर्मसंस्थापनेचे कार्य संपादन करण्यांकरिता महाविष्णू निरनिराळे अवतार घेतो असा सिद्धांत भगवद्‌गीतेंत स्पष्टपणें मांडला आहे, पण त्या पूर्वी ही अवतार वाद अस्तित्वांत नव्हताच असें मात्र म्हणता येत नाही. साधारणपणें असें प्रतिपादन करण्यात येतें की अवताराची कल्पना गुप्तकाळात रूढ झाली, पण हा सिद्धांत निर्विवाद रूपानें ग्राह्य झाला आहे असें नाही. एक मत असें ही मांडण्यांत येते कीं अवतार नावांनी प्रसिद्ध असलेल्या वराह संकर्षणादि देवता गुप्तकाळांपूर्वी अस्तित्वात होत्या, पण वैष्णव अवतारांच्या साखळीत मात्र त्यांना स्थान मागहून मिळाले.सर्वसाधारणपणे विष्णूचे दहा अवतार आहेत असे मानले जाते. यामध्ये प्रामुख्याने मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे आहेत. परंतु ही संख्या एवढीच सीमित नाही. तर ती वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये कमी-जास्त होताना आढळते. ही संख्या १०, १५, २०, २२ नाही तर सात्वत संहितेमध्ये ३९ अवतारांची नावे आढळतात.यामध्ये गौतम बुद्धांचाही समावेश केल्याचा दिसतो. प्रचलित दशावतारांपैकी पहिले पाच अवतार हे विष्णूचे दैवी दर्शवितात. पुढील अन्य अवतार हे मानवी अवतार आहेत.
    भारतीय परंपरेत विष्णूच्या सगळ्या अवतारांना समान स्थान प्राप्त आहे असें नाही. काही अंशावतार असतात. काही तात्कालिक स्वरूपाचे अवतार असतात व काही पूर्णावतार असतात. वराह, वामन, परशुराम आदि प्रथम प्रकारचे नृसिंहादि दुसऱ्या प्रकारचे व राम आणि कृष्ण तिसऱ्या प्रकारचे अवतार होत. पूजनीयतेच्या दृष्टीनें बुद्ध व कल्की यांना स्वतंत्र स्थान नाही. त्याचप्रमाणें मत्स्य कूर्माचे स्थान नगण्य आहे, बाकीच्याची मात्र देशकालपरत्वें स्वतंत्र पूजा होते, पण त्यात ही आतां रामकृष्णांचे स्थान सर्वोच्च आहे.
   विष्णूंच्या अवतारांच्या नावां व संख्येबद्दल बराच वाद आहे. उदाहरणार्थ काही याद्या पहा. 

ग्रंथ

अवतारांची नांवे

एकूण संख्य

वाल्मीकीय रामायण   

(युद्ध. ११७.१२-३१)

एकशृंग वराह, कृष्ण,  राम

परशुराम, त्रिविक्र

महाभार

(शांति., ३३९.१०३-)

हंस, कूर्म, मत्स्य, वराह, नृसिंह, वाम

परशुराम, राम, कृष्ण (सात्वत), कल्क

 

मत्स्यपुराण 

(४७.२३४-५०)

यज्ञ, नृसिंह, वामन, दत्तात्रेय, मांधात

जामदग्न्य, राम, वेदव्यास, बुद्ध, कल्क

अग्निपुरा

(४९.-

मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम,

राम, राम (बल), बुद्ध, कल्क

 

वायुपुरा

(९८.७१-११७)

यज्ञ, नरसिंह, वामन (उपेंद्र), दत्त,

मान्धाता, जामदग्न्य, राम, वेदव्यास,

कृष्ण, कल्क

ब्रह्मपुरा

(२१३.-४३; २१३.७६-१६८)

वराह, नृसिंह, वामन, दत्त, जामदग्न्य,

राम, कृष्ण, कल्की   

पद्मपुराण (पंचम खंडात 

अवताराचे विस्तृत वर्णन आहे

मत्स्य (अध्या. २३०), कूर्म (.२३१-३२)

वराह (अध्या. २३७), नृसिंह (.२३८)

वामन (अध्या. २३९), परशुराम (.२४१)
      राम (अध्या. २४२-२४४), कृष्ण (.२४५-५२)
      कल्की (अध्या. २५२.२१), बुद्ध (.२५२.१९-२०)

स्कंदपुराण, वैष्णवखंड 

वासुदेव माहात्म्य (१८.१६-४५

वराह           कपिल        कृष्

मत्स्य            दत्त           व्या

कूर्म             ऋषभ        बुद्ध
 नृसिंह    राम (परशु)         कल्की
         वामन     राम (दाशरथी)         

विष्णुपुराण (तीन..३६-४४

यज्ञ              हरि 

अजित         मानस         वाम

सत्य           वैकुं

विष्णुधर्मोत्तर पुराण (तीन .८५

नृसिंह         पद्मनाभ          मोहिन

वराह            वामन            पृथ

कपिल         कूर्म             भार्गवरा

विश्वरूप        हंस           दाशरथीरा

हयग्रीव        मत्स्य            वाल्मीक

दत्तात्रेय

 
 
 ग्रंथ                                       अवतारांची नांवे                                                        एकूण संख्या

वाल्मीकीय रामायण              एकशृंग वराह, कृष्ण, राम
 (युद्ध. ११७.१२-३१)             परशुराम, त्रिविक्रम                                                                ५

महाभारत                            हंस, कूर्म, मत्स्य, वराह, नृसिंह, वामन
(शांति., ३३९.१०३-४)           परशुराम, राम, कृष्ण (सात्वत), कल्की                                   १०

मत्स्यपुराण                         यज्ञ, नृसिंह, वामन, दत्तात्रेय, मांधाता
(४७.२३४-५०)                     जामदग्न्य, राम, वेदव्यास, बुद्ध, कल्की                                    १०

अग्निपुराण                        मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम,
(४९.१-९)                          राम, राम (बल), बुद्ध, कल्की                                                       १०

वायुपुराण                            यज्ञ, नरसिंह, वामन (उपेंद्र), दत्त,
(९८.७१-११७)                     मान्धाता, जामदग्न्य, राम, वेदव्यास,
                                        कृष्ण, कल्की                                                                          १०

ब्रह्मपुराण                                वराह, नृसिंह, वामन, दत्त, जामदग्न्य,
(२१३.१-४३; २१३.७६-१६८)      राम, कृष्ण, कल्की                                                               ८

पद्मपुराण (पंचम खंडात                मत्स्य (अध्या. २३०), कूर्म (अ.२३१-३२)                         १०
अवताराचे विस्तृत वर्णन आहे)        वराह (अध्या. २३७), नृसिंह (अ.२३८)
                                                वामन (अध्या. २३९), परशुराम (अ.२४१)
                                                राम (अध्या. २४२-२४४), कृष्ण (अ.२४५-५२)
                                                कल्की (अध्या. २५२.२१), बुद्ध (अ.२५२.१९-२०)

स्कंदपुराण, वैष्णवखंड                         वराह           कपिल        कृष्ण
वासुदेव माहात्म्य (१८.१६-४५)              मत्स्य            दत्त           व्यास                           १४
                                                       कूर्म             ऋषभ        बुद्ध
                                                      नृसिंह    राम (परशु)         कल्की
                                                       वामन     राम (दाशरथी)                                                        

विष्णुपुराण (तीन.१.३६-४४)                   यज्ञ              हरि          
                                                        अजित         मानस         वामन                               ७
                                                         सत्य           वैकुंठ

विष्णुधर्मोत्तर पुराण (तीन अ.८५)               नृसिंह         पद्मनाभ          मोहिनी
                                                           वराह            वामन            पृथु
                                                           कपिल         कूर्म             भार्गवराम                   १६
                                                           विश्वरूप        हंस           दाशरथीराम
                                                           हयग्रीव        मत्स्य            वाल्मीकी
                                                          दत्तात्रेय
 
 श्रीमद्भागवतात अवतारांची संख्या एकदा २२४६, दुसऱ्यांदा २३, व तिसऱ्यांदा १५ दिली आहे. महाकाव्ये व पुराणग्रंथ या शिवाय इतरत्र अवतारांच्या याद्या दिल्या आहेत, पण तेथें ही एकरूपता आढळत नाही उदाहरणार्थ
    वृद्धहारित स्मृती                                       १०
     अहिर्बुध्न्यसंहिता                                    ३९
     अभिलाषितार्थ चिंतामणि                         ७
   या काही निवडक याद्या देण्यांचा हेतु एवढेच दाखविणें आहे कीं विष्णूच्या अवतारांची दहा ही संख्या बरीच लोकप्रिय असली तरी ती सर्वनुमतें ग्राह्य नव्हती व तपशिलांत ही बरेच फरक होते असें जरी असले तरी सर्वसाधारण भर दोन जलचर (मत्स्य व कूर्म), दोन वनचर (वराह व नरसिंह), दोन ब्राह्मण (वामन व परशुराम), दोन क्षत्रिय (राम, कृष्ण) असे आठ व बुद्ध आणि पुढे होणारा कल्की असे एकूण दहा अवतार मानण्यांकडे होता.
   वरील दहा अवतारांपैकी मत्स्य, कूर्म व कल्की याच्या स्वतंत्र प्रतिमा किंवा मंदिरें गुप्त कालांपर्यंत अस्तित्वांत असावी असे वाटत नाहीं. बुद्धाची मूर्ती कुषाण काळांत घडविली गेली व तिचे पूजन ही चालू झाले, पण ते फक्त बौद्ध धर्मांचे अंग म्हणून, ब्राह्मण धमौत नव्हे, ही स्थिती गुप्त काळांपर्यंत होती. पुढें बुद्धाला ब्राह्मण-मूर्तिशास्त्रांत स्थान मिळाले पण त्या बरोबरच वृद्धहारीतस्मृती सारख्यांनी त्यांच्या पूजनांबद्दल निषेधाज्ञा लावून ठेवली, हीच गोष्ट जैन तीर्थकर ऋषभ यालाही लागू होते. भागवतकारांनी ऋषभालाही अवतारात धरले आहे, पण ब्राह्मणधर्मीय वाङ्‌मयांत त्याच्या प्रतिमें अगर पूजेबद्दल उल्लेख मिळत नाहीत.
    अवतारांसंबंधी दुसरी एक गोष्ट लक्षांत ठेवावयांस हवी कीं जरी बरेचसे अवतार अपूज्य नव्हते तरी त्यांच्या स्वतंत्र मूर्ती घडविण्यांचा सर्व साधारण प्रघात नव्हता. या वर्गात कपिल, वाल्मीकी, अजित, मानस, सत्य वगैरे अप्रसिद्ध अवतार मोडतात.
   या शिवाय प्रत्येक काळांत दहा अवतार ही समान रूपानें स्वीकार्य होते असें नाही. उदाहरणार्थ अष्टभुज विष्णू हा कुषाण व गुप्त काळांत मान्य होता पुढे तो मावळला. या उलट मुरलीधर कृष्ण, व कोदंडपाणि राम गुप्त काळांपर्यंत दिसतच नाहीत.
एवढ्या प्रस्तावाने नंतर प्रत्यक्ष अवतार मूर्तीकडे वळू.
 





  मत्स्यावताराची विवीध शिल्पे
 
मत्स्यावतार :-
    मत्स्यावतार हा पहिला अवतार मानला जातो.। अवताराची मंदिरे मात्र आढळत नाहीत. याची पहिली कथा शतपथ ब्राह्मण ग्रंथात येते. हस्त प्रक्षालन काळ मनूच्या हातात एक छोटा मासा पडतो. तो त्य वाचवण्याची विनंती मनूला करतो. त्याच्या बदल्यात प्रलयकाळी वाचवायचे वचनही देतो. जसजसा तो मासा मोठा होऊ लागतो तसा मनू त्याला मोठ्या भांड्यात ठेवत जसे मग तो टाक्यातही मावेनासा होतो तेव्हा त्याला तो समुद्र नेऊन सोडतो. तो देवमाशाएवढा मोठा होतो. त्याचे नाव झ्द. तो महाकाय मासा मनूला एक मोठे जहाज बांधायला सांग आणि पुढे होणाऱ्या प्रलयाची अचूक वेळही सांगून ठेवतो. त्याच वेळेस नंतर प्रलय होतो आणि सर्व पृथ्वी जलमय होते. मनू सर्व मानवांना आणि प्राणिमात्रांना बरोबर घेऊन त्यात चढतो आणि ते जहाज माशाला दोराने बांधतो. तो मासा ते जहाज ओढत नेऊन उत्तर दिशेला असणाऱ्या ऊंच डोंगरामा सुरक्षित स्थळी सोडतो. अशा त-हेने विष्णूने मत्स्य रूप धारण करून प्रलयात बुडालेल्या पृथ्वीवरील जीवांना वाचवले.
 


 
 
 कुर्मवताराची विवीध शिल्पे

कूर्मावतार :- 

   अथर्व बेद, शतपथ ब्राह्मण, वाजसेनीय संहिता इत्यादी ग्रंथांमध्ये कश्यप किंवा कूर्म या नावांचे त्याचा उल्लेख येतो. परंतु इथे विष्णूचा अवतार म्हणून नाही तर ब्रह्मांड, सूर्य किंवा काल असा संदर्भ दिसतो, रामायण आणि महाभारतात समुद्रमंथनाची कथा येते. भागवत पुराणात हीच कथा तपशिलासह दिली आहे. सागराचे मंथन केल्यास त्यातून अमृत मिळू शकेल असे ब्रह्मदेवाने सांगितले हे एकट्या देवांना शक्य नव्हते म्हणून त्यांनी दैत्यराज बळीला मदतीचे आवाहन केले. अमृतप्राप्तीसा तोही तयार झाला. मंदर पर्वताची रवी केली त्याभोवती बासुकी नागाची दोरी गुंडाळली. मंदार पर्वत व जड असल्यामुळे तो बुडू लागला तेव्हा श्रीविष्णूने कूर्माचे रूप घेऊन समुद्रात बुडी मारली आणि महाकाय रवीला आधार दिला. त्या मंथनातून अनेक रत्ने निघाली आणि शेवटी अमृतकलश प्रकटला. देवांनी त्यातील अमृतं दानवांना द्यायला नकार दिला. तेव्हा दानवांनी तो पळवला. मग विष्णूने मोहिनी रूप घेऊन तो परत मिळवला. पूर्ण कूर्म, अर्ध कूर्म आणि कमरेपासून बर पुरुष रूपातील विष्णू, किंवा समुद्रमंथनात मध्यभागी असे या अवताराचे दर्शन मंदिरांमधील शिल्पात किंवा शिल्पपटात होते. तसेच मोहिनीराज रूपातील विष्णूचे मंदिरही आहे.

वराह :     

 वराहाचे उल्लेख ऋग्वेद, तैत्तिरीय संहिता, कपिष्थल कथा संहिता, शतपथ ब्राह्मण, वायुपुराण यासारख्या ग्रंथात आढळतात. वराहावताराची कथा हरिवंशात येते. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी बुडवली तेव्हा विष्णूने वराहाचा अवतार घेतला, हिरण्याक्षाचे दमन केले आणि पृथ्वीला बाहेर काढले. 
कुषाण कालीन वराहाची आजपर्यंत ज्ञात असलेली एकमेव प्रतिमा मथुरेच्या संग्रहालयांत आहे. (म.सं. ६५.१५) परंतु हिचे डोके तुटलेले आहे (चित्र१०, रे. चि. तेरा४) हा चतुर्भुज असून पाय पसरून उभा आहे. दातांवर पृथ्वी, गळ्यात आखूड वनमाला व छातीवर श्रीवत्स आहे. आपले साधारण हात त्याने कमरेवर ठेवले आहेत व वर उचलेल्या मागील हातांत रथारूढ असे चंद्र-सूर्य घेतले आहेत. पाय शिळेवर कुषाण ब्राह्मींत खंडित लेख आहे. 
वराह रूप में विष्णु, उदयगिरि गुफाएँ
भू-वराह, गुप्त काल, विदिशा, मध्य प्रदेश (स्रोत: जीन पेरी) 
गुप्त काळातील हे एक अत्यंत लोकप्रिय शिल्प आहे. वराहाच्या रूपात विष्णू, चतुर्भुज किंवा अधिक भुजा असणारा पुरुष त्याचे मुख केवळ वराहाचे, त्याच्या पायाखाली दानव आणि हातावर पृथ्वी जिने त्याच्या मुखाभोवती हात घालून विळखा घातला आहे असे शिल्प अनेक मंदिरात दिसते. याला भूवराह किंवा नृवराह म्हणतात. याशिवाय पूर्ण रूपातील वराहाचे शिल्प पण दिसते. त्याला यज्ञवराह म्हणतात. खजुराहोमध्ये लक्ष्मण मंदिराच्या समोर एका मंडपात याचे भव्य शिल्प आहे.
   गुप्तकाळांत वराहोपासना बरीच वाढीस लागली. या काळांतील बऱ्याच वराह प्रतिमा आपणांस माहीत आहेत. यांचे दोन गट पडतात. प्रथम म्हणजे त्या प्रतिमा ज्यांचे रूप मनुष्याचे असून फक्त मुखमात्र वराहाचे आहे. याला 'नृवराह' असे म्हणतात. गुप्त कालीन नृवराहाची खालील वैशिष्ट्यें नोंद करण्यांसारखी आहेत :
१) वराह आलीढ मुद्रेत उभा असून द्विभुज किंवा चतुर्भुज आहे.
२) याच्या डोक्यावर मुगुट नसून हातांतही पुष्कळदा कोणतेही वैष्णव आयुध दिसत नाही. अपवाद म्हणून नचनाकुठारा येथील वराहाचे हातांत चक्र व शंख आहेत.
३) आपादलम्बिनी वनमाला त्याच्या गळ्यात आहे.
 ४) वराहाच्या वर उचलेल्या डाव्या पायाखाली कुण्डली मारून नमस्कार मुद्रेत असलेला नाग दिसतो. कालिका पुराणांच्या मतें सात फणांचा हा नाग अनंताचे रूप होय". कांही ठिकाणी याची दोन रूपें असून हा सपत्नीक असतो (बर्लिन प्रतिमा) पण काही ठिकाणीं त्याचे अस्तित्व असत नाही (उदा. एरण प्रतिमा). नाग हे जलांचे प्रतीक होय. विष्णूनें हिरण्याक्ष नांवाच्या दैत्याचा वध करून जलांत बुडलेल्या पृथ्वीचा उद्धार केला होता.
५) वर आणलेली पृथ्वी बहुतेक वराहाच्या सुळ्यावर लोंबलेली असते. पण उदयगिरी येथे ती एका कमळावर दाखविली आहे. दुसऱ्या गटाच्या वराहमूर्तीत तो आपल्या मूळ रूपांत अर्थात् पशुरूपांत दाखविला आहे. याला 'यज्ञ वराह' असें नांव असून याचा अभिप्राय वराहाचे संपूर्ण शरीर यज्ञमय होय हे सुचविणे आहे. या प्रकाराची एरण येथील मूर्ती विशेष उल्लेखनीय आहे तिच्या देहांवर वल्कले नेसलेले व कमण्डलु घेतलेले ऋषि असून इतर देवही कोरलेले आहेत. वराहाच्या गळ्यांत असलेल्या माळेवर राशी कोरलेल्या दिसतात. या प्रकारच्या अंकनपद्धतीने पुराणात वराहासाठी वापरलेल्या अनेक शब्दाचा बोध करविण्यांचा प्रयत्न केलेला दिसतो. तशा प्रकारचे काही ठळक शब्द म्हणजे 'वेदवेदाङ्तनु", वेदमयशरीर", रोमान्तरस्थमुनिगण", पशुजानुमरवाकृति' वगैरे होत.
     मत्स्यपुराणांत नृ-वराहाला 'महावराह' असे ही नांव दिले आहे", अग्निपुराणकार यालाच 'भूवराह' म्हणतात व याच्या स्थापनेचे फल राज्य प्राप्ती होय असें सांगतात.

नृवराह :

          पाकिस्तानच्या पुरातत्त्व विभागांत असलेला सुमारे ५-६ व्या शतकांतील नृवराह वेगळ्या प्रकारचा आहे. हा बांडासाहेबखेल, बन्नू, उत्तर पश्चिमप्रांत येथे उत्खननांत मिळाला. या शिल्पाची वैशिष्ठ्यें खालीलप्रमाणे आहेत :
-सापाच्या पोटावर आलीढ मुद्रेत उभा, तोंडावर दाढी, चेहरा वराहाचा पण कान माणसाचे, पोषाख सॅसेनियन पद्धतीचा, डोकीवर बसकी टोपी, भालपट्ट, लांब झगा, उजव्या हातांत चक्र, उपबाहूत शेषाची शेपटी, डावा मांडीवर, दुसऱ्यात शंख, डाव्या कोपरावर बसलेली पृथ्वी, पायाखाली सात फणा असलेला मान वळवून वर पहाणारा पण उताणा पडलेला शेष, वगैरे.

नृवराह शिल्प

- वराहाची एकूण घडण सॅसेनियन पद्धतीची असली तरी पृथ्वीच्या अंकनावर मात्र तशी छाप दिसत नाही (रे.चि.वि.४)
Farid Khan, Recent discoveries from North-West Frointiers Pakistan, SAS 8, 1972 figs. 2,3,4 pp. 67-69

नरसिंह:

   या अवताराचा समावेश विष्णूच्या अवतारांमध्ये कसा झाला असावा याबद्दल स्पष्टता नाही. तैत्तिरीय आरण्यक, महानारायण उपनिषद यामध्ये सिंहरूपी देवाचे वर्णन आढळते. अवतारकथा विष्णू पुराणात अगदी थोडक्यात तर हरिवंशात थोडी विस्ताराने येते. प्रचलित आणि रूढ असलेली प्रल्हादाची कथा भागवत पुराणात आढळते. हजार वर्षे तप करून हिरण्यकशिपु या दैत्यांच्या सम्राटाने ब्रह्मदेवाची उपासना करून त्याला प्रसन्न केले आणि मृत्यू न येण्याचा एक विचित्र वर मागितला. ज्यामध्ये देव, दानव किंवा प्राणी, हात किंवा शस्त्र, दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर आणि जमिनीवर किंवा हवेत त्याला मरण येणार नाही अशा अटी होत्या. या अटींच्या यादीत मनुष्य नाही. या सगळ्या अटी कोणताही मनुष्य पूर्णच करू शकणार नाही याची त्याला खात्री होती. याचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त झाला. त्याला मारायचा पुष्कळ प्रयत्न हिरण्यकशिपुने केला. परंतु प्रत्येक वेळेला श्रीविष्णूने त्याला वाचवले. एक दिवस हिरण्यकशिपुने त्याला विचारले की, जर तुझा सगळीकडे आहे तर तो या खांबातही आहे का? त्यावर त्या बालकाने हो असे उत्तर हिरण्यकशिपुने चिडून त्या खांबाला लाथ मारली. त्यामुळे तो खांब दुभंगला आणि त्यातून अधां आणि अर्धा पुरुष असा अवतार प्रकटला. हिरण्यकशिपु आणि त्याच्या सैन्याने नृसिंहावर चढवला. तुंबळ युद्ध झाले. देवाने सर्व दानवांना मारले. शेवटी संध्याकाळी, घराच्या उंबऱ्यावा त्याला मांडीवर घेऊन नखांनी त्याचे पोट फोडले. अशा तन्हेने हिरण्यकशिपुने मागितलेल्या करा सर्व अटींची पूर्तता करून नृसिंहाने त्याचा वध केला. मंदिरांमध्ये खांबातून प्रकट होणारा, हिरण्यकशिपुबरोबर लढणारा, एकटा नृसिंह किंवा लक्ष्मी नृसिंह अशी नृसिंहांची शिल्पे आढळतात. स्वतःच्या मांडीवर घेऊन हिरण्यकशिपुचे पोट फाडणारा असे त्याचे सर्वात प्रचलित शिल्प आहे. वाकाटक काळातील नृसिंहाचे दोन मंदिरे रामटेक वे टेकडीवरील राम मंदिराशेजारी आहेत. ज्यामध्ये बसलेल्या नृसिंहाची उत्कृष्ट शिल्पे आहेत.
     आजपर्यंत माहीत असलेल्या नरसिंहाच्या प्रतिमांपैकी प्राचीनतम मूर्ती आंध्रप्रदेशांत मिळालेल्या 'कोण्डामोतु' शिलापट्टावर कोरलेली आहे. पंचवीरांच्या ओळीत येथे असलेला नरसिंह सिंहरूपांत आहे. पुढील पाय व पंजे सरळ ठेऊन मागच्या पायावर बसलेल्या सिंहाचा विष्णूंशी संबंध दाखविण्यांकरिता त्याच्या मानेंजवळून गदा व चक्र अशी दोन आयुधं घेतलेलें दोन हात उगवतांना दाखविलें आहेत (र.चि.तेरा २.) ही प्रतिमा गुप्तकाळांच्या पूर्वीची आहे.
       हरिवंशातील एका उल्लेखांप्रमाणें '' या अवतारांत हिरण्यकशिपु नांवाच्या दैत्याचा वध करण्यांस विष्णू प्रथम सिंहरूपात प्रगट झाला व नंतर त्याने स्वतःस दोन भागांत विभाजित केले व तो नरसिंह झाला. वरील शिलापट्टांवर विभाजनांची प्रक्रिया दाखविली असणें संभव आहे.
       गुप्त काळांतील नरसिंहाच्या सुमारे दहा " प्रतिमा आपणांस माहीत आहेत (उदा. चित्र ११) पैकी बऱ्याच खंडित आहेत. त्यामुळे त्यांची सर्व सामान्य लक्षणे सांगणे कठिण आहे. एवढे मात्र म्हणता येईल की वराहांप्रमाणें नृसिंहाच्या देखील मानवपरिमाण मूर्ती घडवीत असत. डोक्यावर मुगुट नसे, फक्त वनमाला व जरूरीप्रमाणें आयुधं दाखवीत.
       देवगढ येथील प्रतिमा मात्र 'केवल नरसिंहा'ची आसनमूर्ती आहे. येथें डावीकडे नमस्कारमुद्रेत कदाचित प्रल्हाद असावा असे वाटते.
     तिसरा प्रकार नचनाकुठारा येथे पहावयास मिळतो. या ठिकाणी नरसिंह हिरण्यकशिपूशी युद्ध करतांना दाखविला आहे. उत्तर भारतांपेक्षा दक्षिणेंत नरसिंहाचा जास्त प्रचार होता. 'सिलप्पदिकारम्' सारख्या संगम साहित्याच्या प्राचीन ग्रंथांत नरसिंहाचा उल्लेख आढळतो. शिवाय या अवताराची सर्वांत जुनी प्रतिमा ही आंध्रप्रदेशांतूनच मिळाली आहे. पुढे दक्षिणेंत नरसिंहांचे बरेच प्रकार अस्तित्वांत आले.

केवल नरसिंह :

      मोधादक (ताडीकोंडमंडल, गुन्तूर) येथून हाती आलेला (तूर्त स्थानीय संग्रहालय, अमरावती) नरसिंह उजव्या हातांत चक्र घेऊन व डावा मांडीवर ठेऊन राजलीला सनांत बसला आहे. दक्षिण भारतांतील हा प्राचीनतम नरसिंह असावा. (रे.चि.वि.५)
I.K. Sarma, Early Bhuvaraha and Narasiniha Images from Elal Govindrai Pet, Ranga Reddi, A.P., IAH, 1990 Pl. 1A, pp. 549-56

केवल नरसिंह

विष्णू बैठकीवर चक्रपुरुष :

      पाल कलेचा एक स्थानक विष्णू (तूर्त राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली) वर, शंख, पद्म आणि चक्र घेतलेल्या या विष्णू प्रतिमेच्या बैठकीच्या दर्शनी भागावर एका वर्तुळांत डावीकडे कललेला दहा हाताचा चक्रपुरुष सुखासनांत बसलेला आहे. दोन हात डोक्यावर जुळले आहेत, इतर हातांत बाण, खड्ग, घंटा, धनुष्य, ढाल ही आयुधं आणि वर अभय (वितर्क) या मुद्रा दिसतात (रे.चि.वि.६)
  R.C. Agrawala, Unpublished Sculptures and Terracottas in the National Museum, New Delhi, Some Allied Problems, EW., 17, Figs. 17, 18. p. 280

वामन व त्रिविक्रम :

    तीन पावलात विश्व व्यापून टाकणाऱ्या वामन- त्रिविक्रमाचा उल्लेख ऋग्वेदात अनेक ठिकाणी आढळतो. शतपथ ब्राह्मण या ग्रंथात त्याची कथा थोडी विस्ताराने दिसते. पुढे तैतिरीय संहिता, रामायण आणि अनेक पुराणात ही कथा येते. दैत्यराज बळीने तिन्ही लोक व्यापून असुरांचे राज्य स्थापन केले. त्या वेळेस भगवान विष्णू वामनाचे म्हणजे एका छोट्या बटूचे रूप घेऊन बळीने आरंभिलेल्या यज्ञात गेले. यज्ञात त्यांनी दान मागितले. तेव्हा बळीने दान म्हणून तो छोटा वामन त्याच्या तीन पावलात जेवढी जागा व्यापेल तेवढी त्याने देवांना देण्याचे मान्य केले. यावर विष्णूने आपले विराट रूप प्रकट केले. पहिल्या पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्याप्त करून टाकला. आता तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारल्यावर बळीने आपले मस्तक पुढे केले. तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात लोटून दिले. याची दोन शिल्पे प्रचलित आहेत. एका शिल्पात छत्रीधारी बटू रूपातील विष्णू असतो. अन्य शिल्पात एक पाय जमिनीवर आणि दुसरा आकाशाकडे उचलेल्या पुरुषरूपी विष्णूचे शिल्प असते. अशा शिल्पात उचललेल्या पायाखाली काही छोटी शिल्पे असतात. ज्यामध्ये दान देण्यासाठी झारीतून पाणी सोडताना बळी दिसतो तर त्याच्या पाठीशी दैत्यांचे गुरू शुक्राचार्य उभे असतात. वामनाची मंदिरे आढळतात. खजुराहोमध्ये वामन मंदिर आहे ज्यात गर्भगृहात वामनमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
चित्र क्र. ३७ वामनावतार, पाटण
 
         त्रिविक्रमांच्या कथेचे धागेदोरे जरी ऋग्वेदांपर्यंत पोहोचत असले तरी त्याची निश्चित अशी प्रतिमा गुप्तकाळाच्या पूर्वी होती हे सांगणे सोपे नाही. लखनऊ येथील संग्रहालयात असलेल्या एका कुषाण कालीन विष्णुप्रतिमेत (ल.सं.जे.६१० चित्र १२) तिचे उघडे डोकें, पायांशी खुरमांडी घालून व कांही तरी भांडे घेऊन बसलेली व्यक्ती, दान घेण्याकरितां जसा हात पसरतात, जवळ जवळ तसा पसरलेला विष्णूचा उजवा हात व विष्णूचा आकार या आधारांवर लेखकाने ही मूर्ती म्हणजे कुषाण कालीन त्रिविक्रमाचे रूप असल्याचे सुचविले आहे. पण ही सूचना अजून कयास पलीकडे गेलेली नाही.
        गुप्तकाळात मात्र बटु वामन व त्रिविक्रम अशी दोन्ही रूपें दिसू लागली. किंबहुना त्रिविक्रमांचे पायाखाली दान देणारा राजा बळी व त्याच्यापुढे छत्र घेतलेला बटु अंकित करावा असें मत्स्यपुराणानें विधान केले आहे", ह्या बटु वामनाला स्वतंत्र रूपानेही अंकित करीत. तशा स्वरूपांत हा आखुड मांड्याचा असून थोडा ढेंबरपोट्या व ठेंगू असतो. हात दोनच असतात - एकांत माळा व दुसऱ्यांत पाण्याचा गड्डू दिसतो. डोक्यांवर मागे सारलेले केस असतात व ब्रह्मचाऱ्याचे चिह्न म्हणून खांद्यावर जानवें असून त्यातील हरणांचे डोकें ठळकपणें छातीवर दिसते. अलाहाबाद संग्रहालयांतील डोंगरांवर उभा असलेला बटु (रे. चि. अठरा१) व भारत कला भवन, वाराणसीच्या अभिलिखित स्तंभांवरील वामन ही होत. (भा.क.भं.सं. २२५).
बादामी गुफा मंदिर - Wikiwand
त्रिविक्रम मुर्ती
 
     दानोदक हातांवर पडताच ह्या बटूने त्रिविक्रमांचे रूप धारण केले. एक पाय आकाशाकडे उचलून उभा असलेला त्रिविक्रम गुप्त काळांपासून दिसू लागतो. भुजसंख्येच्या आधारांवर या मूर्तीचे दोन गट-चार हातांच्या व आठ हाताच्या प्रतिमा-असे पाडतां येतील. चतुर्भुज त्रिविक्रम विशेष करून मथुरेत रूढ असावा असें दिसते, अशा प्रकारच्या येथे तीन प्रतिमा मिळाल्या आहेत (म.सं.सं.आय्. १९,३६.२६६४, ७०.५८) पण या सर्वांचीच आयुधे खंडित आहेत. फक्त दोन शिल्पांत सामान्य डाव्याहातांत शंख असून उजवा कमरेवर किंवा कमरेजवळ आहे. बाकी हातांत गदा व चक्र असावीत. अष्टभुज प्रकाराच्या चार उल्लेखनीय प्रतिमा आपणास माहीत आहेत. यांत पदमपवायाची मूर्ती (रे.चि.१५.३) सगळ्यात जुनी आहे. तिची खालील वैशिष्ट्यें पहा.
१) त्रिविक्रमांचे आठ हात त्यांच्या वाढत्या बळाचे प्रातिनिध्य करतात.
२) त्याचे रूप विश्वव्यापी असल्यामुळे सूर्य चंद्र त्याच्या बाजूला आले आहेत.
३) ऋक्षराज जांबवान त्याची प्रदक्षिणा करीत आहे.
४) त्रिविक्रमांबरोबरच बळीचा यज्ञमंडप, दान घेणारा वामन वगैरेही कोरले आहेत.
५) त्रिविक्रमांच्या पाठीकडे कमलधारिणी लक्ष्मी उभी आहे.
६) पदमपवाया प्रतिमेचा उजवा भाग तुटलेला आहे, पण नेपाळ व मधुरेच्या मूर्तीच्या मदतीनें कल्पना करतां येते कीं त्या कडेला विष्णूनें वर उचलेला डावा पाय असावा. कालिदास या पायाला 'तिर्यगायामशोभिपादः' असें म्हणतो
७) ह्या वर उचललेल्या पायाचे पाऊल एका राक्षसी तोंडाला जाऊन भिडते हे तोंड विष्णुधर्मोत्तरपुराणांच्या मतें 'बटबटीत डोळ्याच्या एका देवाचे आहे. ८' वराहपुराण याला फुटणाऱ्या ब्रह्मांडांचे प्रतीक मानतें, " महाभारत व कुर्मपुराण (ब्रह्म) अंडाचे कपाल असे म्हणतात व श्री. बॅनर्जी याला राहू असें मानतात. या सर्व मतांत त्या तोंडाला 'ब्रह्मांड कपाल' असें मानणें युक्तिसंगत आहे.
८) त्रिविक्रमांच्या उजव्या पायाला जवळ जवळ मिठी मारलेला एक पुरुष दिसतो. हा राजा बळी असावा.
    वैखानसागमांत त्रिविक्रमाच्या ध्यानांचे विस्तृत वर्णन आहे. त्यांत सूर्य-चंद्रादि परिवार देवता, ढोलकें वाजविणारा जांबवान, राजा बळी व राणी विंध्यावली, नमूचि, वगैरे दैत्य, गंवा इत्यादि अनेकांची गणना केलेली आहे. यापैकीं बऱ्याच गोष्टी वरील मूर्तीत दिसतात, उत्तरेपेक्षा दक्षिणेंतील मूर्ती वैखानसागमाला साहजिकच जास्त जवळच्या आहेत.

   वामनाची कथा :-

वामनावताराची पुराणांतली कथा ही मूळ वैदिक रुपक कथेचे ऐतिहासिक अलंकारिक रुपांतर आहे. पुराणांतली कथा सर्वांस परिचित आहे. तेंव्हा ही कथा मूळची ऋग्वेदांतली पहिल्या मंडलातली २२ व्या व १५४ व्या सूक्तांमधील ऋचेंवरून घेतली आहे, ज्यात तो सूर्य अर्थात विष्णु ह्या तीन गोष्टींना आपल्या तीन पाऊलांत व्यापतो. ज्यात ही तीन पाऊले म्हणजे दिवसाचे तीन सकाळ, सायंकाळ व रात्र असे तीन भाग किंवा विश्वाचे पृथ्वी, आकाश व पाताळ असे तीन भाग ह्या अर्थाने आहे. ही सूर्यकिकरणांनी व्यापिलेल्या ह्या तीन भागांची रुपक कथा ऋग्वेदामध्ये आहे. ह्या तीन पाऊलांत तो सूर्य अर्थात विष्णु सर्व विश्व व्यापितो. ते मूळ पाच मंत्र पाहुयांत.
    अतो॑ दे॒वा अ॑वंतु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे । पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः ॥१६॥
    इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दं । समू॑ळ्हमस्य पांसु॒रे ॥१७॥
    त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः । अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् ॥१८॥
    विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥१९॥
    तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यंति सू॒रयः॑ । दि॒वी॑व॒ चक्षु॒रात॑तं ॥२०॥
    तद्विप्रा॑सो विप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते ।विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दं ॥२१॥
    ह्या पाचही मंत्रांचा अर्थ सायण नावाच्या भाष्यकारानुसार सांगायचा तर विष्णूने अर्थात सूर्याने ह्या संसारास तीन पाऊलांनी व्यापिलं आहे. इथे सायणाचार्यांचे भाष्य आपण अभ्यासले तर इथे अकारण वामनावताराची मनगढन्त कल्पना केली आहे. वेदांमध्ये कोणत्याही अवताराची कथा नाहीये. पण पुराणांमध्ये ती आलीय. आता १५४ वं पूर्ण सूक्त पाहुयांत.
    विष्णो॒र्नु कं॑ वी॒र्या॑णि॒ प्र वो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजां॑सि ।
    यो अस्क॑भाय॒दुत्त॑रं स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यः ॥१॥
    प्र तद्विष्णुः॑ स्तवते वी॒र्ये॑ण मृ॒गो न भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः ।
    यस्यो॒रुषु॑ त्रि॒षु वि॒क्रम॑णेष्वधिक्षि॒यंति॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥२॥
    प्र विष्ण॑वे शू॒षमे॑तु॒ मन्म॑ गिरि॒क्षित॑ उरुगा॒याय॒ वृष्णे॑ ।
   य इ॒दं दी॒र्घं प्रय॑तं स॒धस्थ॒मेको॑ विम॒मे त्रि॒भिरित्प॒देभिः॑ ॥३॥
    यस्य॒ त्री पू॒र्णा मधु॑ना प॒दान्यक्षी॑यमाणा स्व॒धया॒ मदं॑ति ।
    य उ॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वीमु॒त द्यामेको॑ दा॒धार॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ॥४॥
    तद॑स्य प्रि॒यम॒भि पाथो॑ अश्यां॒ नरो॒ यत्र॑ देव॒यवो॒ मदं॑ति ।
    उ॒रु॒क्र॒मस्य॒ स हि बंधु॑रि॒त्था विष्णोः॑ प॒दे प॑र॒मे मध्व॒ उत्सः॑ ॥५॥
    ता वां॒ वास्तू॑न्युश्मसि॒ गम॑ध्यै॒ यत्र॒ गावो॒ भूरि॑शृंगा अ॒यासः॑ ।
    अत्राह॒ तदु॑रुगा॒यस्य॒ वृष्णः॑ पर॒मं प॒दमव॑ भाति॒ भूरि॑ ॥६॥
     ह्या सूक्ताचा संक्षेपांत अर्थ पहायचा म्हटला तर मी त्या विष्णूचे अर्थात सूर्याचे वर्णन करतो ज्याने तीन पाऊलांत समग्र विश्व व्यापिले आहे व आकाशांस स्थिर केले आहे. ज्याने पृथ्वी, द्युलोक व समस्त भूवनांस धारण करून ठेवलेलं आहे, ज्याने निर्माण केलेल्या औषधी, अन्नादिंनी मनुष्याचे पोषण होते, त्यांस मी वंदन करतो.

   इथे विष्णु म्हणजे दुसरे कुणीही नसून तो सूर्य ह्या अर्थाने आहे. सूर्य तीन पाऊलांनी तीन भूवने व्यापितो ह्याचाच अर्थ विष्णूची तीन पाऊले आहेत.
    आश्चर्य म्हणा किंवा शोकांतिका म्हणा, ह्या संपूर्ण मंत्रांमध्येच काय पण चारीही वेदांमध्ये कुठेही बलीचा साधा किंवा पुसटसा उल्लेखही नाहीये. नाही म्हणजे ना आणि ही. तरीही पुराणांनी ही मनगढन्त कथा का रचली व त्यासाठी व्यासांचा नावाचा बळी अकारण का दिला हेच कळत नाहीये. ऋग्वेदांतले आणखी काही मंत्र जिथे जिथे ह्या तीन पाऊलांच्या विष्णु म्हणजे सूर्याच्या तीन पाऊलांच्या कथेचा वामनावताराशी वरवरपाहता अर्थ प्रतिध्वनित होतोय असा भ्रम होतो. ऋग्वेद १.११५.४,६.४९.१३,७.१००.४८.१२.२७ ह्या सर्वांत व अन्यत्र "उरुगाय", " विचक्रमे", उरुक्रम:, मिमान:,  रजसो विमान:, पार्थिवानि विममे आदि मंत्रांमध्ये देखील हेच विष्णुच्या त्रिपाद विक्रमाचे संदर्भ आहेत. अन्य तीन वेदांतले मंत्रही ह्याच प्रकारचे असून तिथेही विष्णुच्या अर्थात सूर्याच्या किंवा परमेश्वराच्या त्रिपाद विक्रमाचे वर्णन आहे.
आता भाष्यकारांचे अर्थ पाहुयांत.
     स्कंदस्वामी नावाचे ऋग्वेदांवरचे सर्वात प्रथम भाष्यकार ह्याचा मुख्यत: इतिहासपरक व गौणत: सूर्यपरक असा दोन्ही अर्थ करतात. इतिहासपरक अर्थ करताना ते  सप्तधाम अर्थात पृथ्वीचे सात द्वीप असा अर्थ करतात. १.२७.२० ह्या मंत्राचा अर्थ प्रकट करताना स्कंदस्वामी सूर्यपरक अर्थ करतात व त्यात विष्णु हा सूर्य असून जो प्रत्यही विक्रमण करतो व उदय, मध्यान्ह व अस्त ही त्याची तीन पाऊले आहेत असा रुपक अर्थ प्रकट करतात. ते तीन लोकांची आणखी कल्पना करताना अग्नीरुप पृथ्वीस, विद्युतरुप अंतरिक्षांस व सूर्यरुप द्युलोकांस व्यापतो असे रुपक करतात. यजुर्वेदभाष्यकार उव्वट व महीधर हे वामनावतारच मानतात.
      वेंकटमाधव हे भाष्यकार ह्या मंत्रांचा अध्यात्मपरक व सूर्यपरक अर्थ करतात. त्यांच्या मते विष्णु हे परमपद यज्ञ असून सप्तछंद हे सप्त धाम आहेत, मनुष्यांच्या  कर्मांचे बंधन हे ह्या विष्णूचे खरे कर्म आहे. सूर्यपरक अर्थामध्ये ते विष्णूंस इंद्राचा नियोज्य सखा व आकाशांत पसरलेले तेज हे परमपद असा अर्थ घेतात.
     मुद्गल नावाचे भाष्यकार ह्याचा अध्यात्मपरक अर्थ करताना ईश्वरांस जगताचा पालक, रक्षक सांगतात. व त्रेधा ह्या शब्दांवरून ईश्वर हा कर्ता, धर्ता व संहर्ता रुपांत आहे हे सांगतात. गायत्र्यादि सात छंद हे सप्तधाम आहेत असा अर्थ ते करतात.
जिज्ञासूंनी ह्या तीन्ही भाष्यकारांचे भाष्य निम्नलिखित संकेतस्थलांवरून संग्राह्य करून प्राप्त करावे. करावे. https://archive.org/details/RigVeda31 इथे ते प्राप्त होईल.
    वेदमहर्षी श्रीमत्स्वामी दयानंदांचा अर्थ :-वेदांवरचे  षड्वेदांगाना अनुकूल असे आजपर्यंतचे सर्वोत्तम भाष्यकार व वेदादिधर्मशास्त्राविषयीच्या अनेक भ्रांतींचे निवारण करणारे वेदोद्धारक ऋषिश्रेष्ठ, ज्यांची पुण्यतिथी कालच अमावस्येंस झाली, ते आपल्या ऋग्वेद भाष्यामध्ये उपरोक्त मंत्रांचा अर्थ अध्यात्मिक करतात व विष्णुंस संसारांत व्याप्त असण्याने निराकार परमेश्वराचे द्योतक मानतात. ते "त्रेधा निदधे पदम्" ह्या व "विष्णुुपद" ह्याचा संबंध सृष्टीरचनेच्या संदर्भात लावताना परमेश्वर आपल्या पायांनी अर्थात प्रकृती, परमाणु आदि सामर्थ्याच्या अंशाने सर्व जगांस तीन स्थानांमध्ये धारण करतो असा व्यापक अर्थ करतात.
निरुक्तकार यास्कांचा अर्थ :-
 षड्वेदांगापैकी एक प्रमुख अशा निरुक्तामध्ये विष्णुपद ह्या विषयांवर यास्कमूनीसुद्धा परमेश्वराने सृष्टी बनविताना तीन प्रकारची रचना दाखवितात असा अध्यात्मपरक अर्थच केला आहे.
वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकर सुद्धा ह्या मंत्रांचा परमात्मपरक अर्थच लावताना परमात्मा सप्तधामांमध्ये अर्थात पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, तन्मात्रा, महत्तत्व ह्या सात तत्वांत व्याप्त होऊन पराक्रम दर्शवितो असा अर्थ प्रकट करतात. सात्विक, राजस व तामस ह्या तीन भेदांनी क्रमश: द्युलोक, अंतरिक्ष व भूलोक हे तीन पाद अर्थात पाय आहेत असा अर्थ करतात.
जयदेव शर्मा विद्यालंकार ह्यांनी देखील परमात्मपरक अर्थच केला आहे. जास्ती कशाला अहो परकीय अशा पाश्चात्य भाष्यकार मैक्सम्युलर, मैक्डौनेल, कीथ, ग्रिफीथ हे देखील विष्णूंस सूर्य मानूनच अर्थ प्रकट करताना आपल्याला दिसतात.
मग हे वामनाचे स्वरुप आले कुठून???
       तर तैत्तिरीय संहितेमधून २.१.३१ येथून. ह्यानंतरच सर्व परवर्ती भाष्यकारांनी ह्याचा अर्थ अकारण वामनावताराची जोडला आहे.  अर्थात पुराणांनी अकारण बळीला मध्येच घुसडले आहे जे ह्या आधीच्या उपरोक्त ग्रंथांत कुठेही उल्लेखिलेले नाहीये. वेदांवरचे व्याख्यानरुपी असे ब्राह्मणग्रंथांतील वर्णन शतपथ ब्राह्मण ह्या ग्रंथामध्ये ह्याचा अर्थही विस्ताराने वर्णिताना विशुद्ध असा यज्ञपरक केला असून विष्णु हे यज्ञाचे स्वरुप असून यज्ञीय देवता असाही केला आहे. "वामनो हि विष्णुरास:" असे १.२.५.५ येथे शतपथामध्ये म्हटले आहे. "यो वै विष्णु: स यज्ञ:" (५.२.३.६) येथे व "विष्णुर्वैयज्ञ:" असे ऐतरेय, तांड्य, तैत्तिरीय ब्राह्मण व गोपथ ब्राह्मणामध्येही म्हटलेलं आहे.
निरुक्तामध्ये विष्णु शब्दाचा अर्थ पदार्थांमध्ये व्याप्त व प्रविष्ट गुण अशा अर्थाने आहे. त्याची व्युत्पत्ती निम्नलिखित आहे.
   विष्लृ- व्याप्तौ, विश-प्रवेशने, वि पूर्वक अशूङ्-व्याप्तौ धातु पासून हा विष्णु शब्द सिद्ध होतो. निरुक्तावर भाष्यकरताना दुर्गाचार्य, ज्याचे "निरुक्ताचे मराठी भाषांतर" नावाने भाषांतर इतिहासाचार्य राजवाड्यांचे बंधु वैजनाथ काशिनाथ राजवाड्यांनी केलंय, जे पीडीएफ उपलब्धही आहे, त्यातही सूर्य हाच अर्थ दुर्गाचार्य करतात. भगवद्दत्त रिसर्च स्कौलर व शिवनारायण शास्त्री हे निरुक्तभाष्यकारही हाच अर्थ घेतात.
  शौनकाच्या बृहद्देवतेमध्ये सूर्याच्या नावांची व्युत्पत्ती सांगताना
    विष्णातेर्विशतेर्वा स्याद् वेवेष्टेर्व्याप्तिकर्मण: !
    विष्णुर्निरुच्यते सूर्य: सर्वं सर्वान्तरश्च य: !    २.६९
अर्थ - विष्णु हा शब्द व्यापणारा ह्या अर्थाने विष्णूची त्या सूर्यस्वरुपांत व्याख्या केलीय जो सर्व काही व सर्वव्याप्त आहे.
      उपनिषदांमध्येही व्यापक परमात्मा असा अध्यात्मपरकच अर्थ आहे. काठक संहिता ३/९, मैत्रायणी ६.२६, ६.१६, ७.७, तैत्तिरीय १.१.१ येथेही हेच वर्णन आहे. म्हणजे उपनिषदे देखील हाच व्यापक अर्थ प्रकट करतात.
    आता लौकिक साहित्यातला अवतारपरक अर्थ कुठे कुठे आहे ते पाहुयांत. रामायणामध्ये, महाभारतामध्ये तीन वेळा, पुराणांमध्ये तर अतिरंजित असा आहे. अर्थातच तो प्रक्षेप आहे हे सिद्ध आहे.
ह्या सर्वांच्या विवेचनाचा निष्कर्ष काय????
     ऋग्वेदामध्ये कुठेही विष्णुसाठी वामन शब्दाचा प्रयोग नाहीये व बळीचे नावही नाहीये ! आम्ही वरही सांगितलंय की बली हा शब्दही चारी वेदांच्या संहितांमध्ये नाही म्हणजे नाहीच.
वैदिक साहित्यापासून पौराणिक साहित्यापर्यंत ह्या आख्यानाचे अर्थ किती बदललेले आहेत व उत्तरोत्तर ते किती विकृत होत गेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच वैदिक मंत्रावरून जे तसा अवतारपरक व ऐतिहासिक अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात ते सर्व लोक चूकीच्या दिशेवर आहेत हे सांगण्यांस कोणताही प्रत्यवाय नाहीये.
वामन हे नाव व त्याच्या रुपाची प्रेरणा व कल्पना तैत्तिरीय संहिता व ब्राह्मणग्रंथ, जे वेदांवरची व्याख्यानरुपी ग्रंथ आहेत हे आम्ही अनेकवेळा सांगत आलोय, त्या ब्राह्मणग्रंथांमध्येदेखील हे सर्व वर्णन केवळ आख्यानस्वरुपाने आलंय. कारण ब्राह्मणग्रंथांची शैली ही मूळातच आख्यानात्मक व रुपकात्मक आहे. व ती अलंकारिक आहे. त्यामुळे त्यामध्ये ह्या वर्णनांत ऐतिहासिक पक्ष सिद्ध होत नाहीच नाही. आमच्या आधीच्या आचार्य शंकराचार्यांच्या लेखातही आम्ही वेदांमध्ये नित्यपक्ष सिद्ध केला आहे.
आर्याक्रमण सिद्धांत सप्रमाण खोडणार्या एका मुख्यमंत्र्यांच्या ग्रंथांचा संदर्भ
डॉ. संपूर्णानंद हे नाव अनेकांनी ऐकलं असेल. ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. अतिशय विद्वान मनुष्य ! त्यांनी यह आर्योंका आदि देश है
नावाने जो ग्रंथ लिहिलाय, त्यात पृष्ठ क्रमांक २०३ वर वैदिक आख्यान मांडताना ह्या कथेवर भाष्य करताना "सूर्य का पहिय्या व विष्णु के तीन पाद" ह्या शीर्षकाखाली ही पूर्ण वेदांतली कथा कशी रुपक कथा आहे व पुराणांनी अकारण त्याचे कसे ऐतिहासिक रुपांतर करून विपर्यांस केलाय हे सविस्तर लिहिलं आहे. तो ग्रंथ पीडीएफ उपलब्धही आहे. जिज्ञासूंनी तो वाचावा ही विनंती.
अंतिम निष्कर्ष :-
पूर्वोक्त आख्यान हे दोन स्वरुपांत आपणांस पाहता येईल.
१. प्रकृतीपरक अर्थात सूर्याच्या स्वरुपांत
२. रुपक अलंकांरिक अर्थात परमात्मस्वरुपामध्ये
१. ह्यात प्रकृतीपरक अर्थ घेणार्यांमध्ये निम्नलिखित भाष्यकार आणखी सांगता येतील.
    अधिकांश भारतीय तथा पाश्चात्य भाष्यकार जसे यास्कमूनी, शाकपूणि, और्णवाभ, मेधातिथी, शौनक, स्कंदस्वामी, वेेंकटमाधव, लोकमान्य टिळक, मैक्सम्युलर, मैक्डोनल, कीथ, ग्रिफीथ, बेर्गेन, !
     डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण त्यांच्या "इंडियन फिलॉसॉफी"ह्या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये ४९५ पृष्ठांवर सूर्यच अर्थ घेतात. डॉ. बलदेव उपाध्याय त्यांच्या "वैदिक साहित्य  और संस्कृती" ह्या ग्रंथामध्येही सूर्यच अर्थ घेतात. डॉ. एस एन दासगुप्ता देखील आदित्य असाच अर्थ घेतात (दि हिस्टरी एफ इंडियन फिलॉसौफी भाग द्वितीय, पृष्ठ ५३५). डॉ. रामचंद्र मजुमदार हे नामवंत इतिहासकारही सूर्याचेच प्रतीक असा अर्थ घेतात.
   २. अध्यात्मपरक अर्थात परमात्मवाचक अर्थामध्ये महर्षि दयानंद, मुद्गल, जयदेव शर्मा विद्यालंकार, सातवळेकर, महर्षी अरविंदसुद्धा.
 मग आता पुराणांमधल्या वामनावताराच्या कथेचं काय???
तर ही कथा रुपक अर्थाने आहे हे स्पष्ट होत असून त्यात झालेली अत्युक्ती ही त्याज्य असून जरी ती स्वीकारायची म्हटली तरी ती ऐतिहासिक अर्थाने न घेता अध्यात्मपरक व रुपक अर्थाने घ्यावी हीच विनंती !
     तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते
    गुण अवगुण निवाडा, म्हैस म्हैस रेडा रेडा !
    हा तो निवाड्याचा ठाव, खर्या खोट्या निवडी भाव !
    अंगे उणे त्याचे बसे टाळक्यांत, काय करु म्हणे आम्ही धक्का खवंदासि लागतसे !
    जगद्गुरु तुकोबाराय
अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

हयग्रीवः

   घोड्याचे तोंड असलेला हा विष्णूंचाच एक अवतार आहे. आतां जरी हा फारसा प्रसिद्ध नसला तरी महाभारतांप्रमाणे विष्णु, वामन, अग्नी, स्कंद, वगैरे पुराण ग्रंथात आणि लौगाक्षि सारख्या स्मृतिग्रंथांतदेखील 'हयग्रीव', 'हयशीर्ष' किंवा 'अश्वशिर' या नावांने या अवताराचे वर्णन मिळतें. या अवताराची कथा व त्याचे कार्य याबद्दल तो अप्रसिद्ध असल्यामुळें थोडक्यात माहिती देतो.
   जग 'एकार्णव' स्थितीत किंवा प्रलयावस्थेत असतांना 'मधु' आणि 'कैटभ' नांवाच्या दोन दैत्यांनी ब्रह्मदेवाच्या नजरेंसमोरच चारही वेदांचे हरण केले. वेद परत मिळविण्यांसाठी ब्रह्मदेवानें विष्णूंची प्रार्थना केली व विष्णूने अश्वमुख मानवाचे रूप घेऊन सामगायनांस प्रारंभ केला. गाण्यांचे सूर कानी पडतांच दोघेही हातचे वेद टाकून स्वरांच्या दिशेने धावू लागले. वेळ साधून हयग्रीवाने ते वेद हस्तगत केले व ब्रह्मदेवाला दिले. पाञ्चाल देशाच्या गालव नामक ऋषीनें हयग्रीवाची आराधना करून त्याकडून वेदांचा 'क्रम' मिळवला. 'वेदमात्रार्थतत्वज्ञ' होण्यांकरितां हयग्रीवाचा प्रसाद आवश्यक होय असें स्मृतिकारांचे म्हणणे आहे.
   मूर्तिशास्त्रांत हयग्रीवांचे अंकन कुषाण काळांपासूनच सुरु झाले होते. भारतकलाभवन, वाराणसी येथे संग्रहित असलेल्या (भा.क.भ.सं.४८४६ चित्र १३) मथुरेहून मिळालेल्या हयग्रीवाच्या चतुर्भुज प्रतिमेंस घोड्यांचे तोंड असून मागील हातांत गदा व चक्र अशी आयुधे आहेत. तो मांडी घालून बसला आहे व त्याचा उजवा हात पोटावर असून
    डाव्यातील लांबट वस्तू मात्र नीट ओळखतां येत नाही. (रे.चि. तेरा ३) गुप्तकाळातील हयग्रीवाच्या मूर्ती मोजक्याच आहेत. त्यापैकीं एक मथुरेत असून (म.सं.सं. ३६.२६६४) दुसरी तेथूनच मिळालेली असली तरी आज पश्चिम बर्लिन येथे आहे. ही विष्णू-नरसिंह वराह-हयग्रीवाची सर्वतोभद्र मूर्ती महत्त्वाची आहे. येथें हयग्रीवाचा अभयमुद्रेत उजवा हात खांद्यापर्यंत उचलेला असून डाव्यांत वेदांची पोथी दिसत आहे. बाकी दोन हात प्रलंबावस्थेत असून आयुधपुरुषांच्या डोक्यावर ठेवलेले आहेत. विशेष म्हणजे गदा देवी उजवीकडे नसून डावीकडे आहे.

मधुकैटभारि :

    विष्णूनें हयग्रीवरूपांत मधुकैटभांपासून वेद परत मिळविले पण त्या दैत्यांचा वध केला नाही. त्यांसाठी 'मधुकैटभारि' या नांवाने दुसरा अवतार झाला. ही कथा हरिवंशांत मिळते. ब्रह्मदेवानें मातीचे दोन महाअसुर केले. दुसऱ्या पर्यायाप्रमाणें विष्णूच्या कानापासून त्यांचा जन्म झाला. यातील एक 'मऊ' व दुसरा 'कडक' वाटल्यामुळे ब्रह्मदेवाने पहिल्यास 'मधु' व दुसऱ्यास 'कैटभ' असे नांव दिले. पुढें हे असुर वरदर्पित झाले, ब्रह्मदेवाला पळ काढावा लागला व शेवटी विष्णूनें त्या दोघांना आपल्या हातांने चिरडून टाकले. दोघांचे देह पुनः एक झालें, जल लहरीनी घुसळले गेल्यामुळे त्याच्यातून मेद वाहू लागला व पृथ्वीला 'मेदिनी' अशी संज्ञा प्राप्त झाली. याशिवाय महाभारताच्या सभा, वन आणि शांतिपर्वात" मधुकैटभाची कथा आढळते पण तपशिलांत थोडा फरक आहे. विष्णूनेच मातीच्या या दोघा असुरांना प्रथम अनेक वर दिले व नंतर युद्धांत त्यांना आकाशाखाली आपल्या उघड्या मांडीवर दडपून दोघांची डोकी चक्राने कापली.
    मधुकैटभवधाचे अंकन करणारे दृश्य गुप्त कलेंत क्वचित आढळते. भीतरगाव येथील इष्टिका मंदिरावर एक फलकांत या दोघां असुरांना दोन हातांनी धरून मांडीवर चिरडणाऱ्या विष्णूची प्रतिमा आहे (चित्र१४).

मधुकैटभारि शिल्प

हरि अथवा करिवरद :

    आपल्या नित्यपाठांत असलेल्या 'पञ्चरत्नी' गीतेंत एक रत्न म्हणून गजेन्द्रमोक्षाची कथा दिलेली असते. गजेन्द्र नांवाच्या एका हत्तीचा पाय पाण्यांत असलेल्या एका मगरानें धरला व हत्तीस आपल्याकडे ओढू लागला. संकटात सापडलेल्या गजेंद्राने विष्णूचा धावा केला व जवळचे कमळ उपटून ते विष्णूस समर्पण करण्याकरिता त्याने सोंड वर केली. विष्णू गजेंद्राच्या हांकेस ओ देऊन गरुडावर बसून धावून आला व त्याने आपल्या चक्राने मगराचा वध करून हत्तीस सोडविले.
  a
 पट्टदकलमधलं अप्रतिम गजेन्द्रमोक्ष शिल्प
IMG-20240715-WA0014
गजेंद्र मोक्ष, लकुलीश मंदिर,पावगढ, गुजरात. संभवता:सातव-आठवे शतक.
 
    'करी'ला वर देणारा हा विष्णूचा अवतार 'करिवरद' या नावांने ओळखला जाऊ लागला. यालाच 'हरि' असेही म्हणतात. ही कथा वैष्णव वाङ्मयांत बरीच गाजली व कलेत ही तिचे पडसाद उमटले. पण काही ठिकाणी-विशेषतः गुप्तकलेत-मगराच्च्या ऐवजी हत्तीचा पाय पकडणारा एक सर्प दिसू लागला. देवगढ येथून मिळालेल्या गजेन्द्रमोक्षाच्या सर्वांगसुंदर अंकनात सर्प, गजेंद्र व गरुडारूढ विष्णू यांचे सुंदर अंकन आहे. गुप्तकलेंत विष्णू विरहित सर्पग्रस्त गजेंद्र फक्त अलंकरणाकरिता देखील वापरलेला दिसतो (ल.स.बी.१०७).

धनवन्तरि :

     बंगलोर येथील शासकीय संग्रहालयांत उत्तर भारतात मिळालेली भुरकट रंगाच्या रेताळ दगडाची गुप्तकालीन विष्णु प्रतिमा आहे. हिच्या सामान्य उजव्या हातात घट असून मागच्या उजव्यांत चक्र, मागच्या डाव्यात गदा व सामान्य तळहातांवर आडवा ठेवलेला शंख आहे. अर्थात् प्रलम्बबाहू असलेल्या या प्रतिमेचा आयुधक्रम इतरांपेक्षा अगदी वेगळा आहे. या शिवाय विष्णूच्या कानातील सिंहकुंडले, आपादलम्बिनी वनमाला, गुडघ्यापर्यंत लोंबणारे जानवें वगैरे गुप्तकालाच्या दृष्टीने उल्लेखनीय गोष्टी आहेत.
धनवन्तरि मुर्ती
 
     उजव्या हातांतील घटामुळे या विष्णू प्रतिमेला 'धनवन्तरि' असे म्हणतात. भागवतकार याला विष्णूचा अवतार मानतात. समुद्रमंथनानंतर त्यातून जी चौदा रत्नें उत्पन्न झाली त्यामध्ये आयुर्वेदाचार्य 'धनवन्तरि' याची ही गणना आहे.

मानवी अवतार :-

   दशावतारांमध्ये बलराम, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बुद्ध हे होऊन गेलेले अवतार आहेत, तर कल्की हा भविष्यकाळात होणारा अवतार आहे. हे सगळे आईच्या पोटी जन्म घेतात आणि मानवी जीवन जगतात. त्यांचे अवतार कार्य संपले म्हणजे इतर मानवांप्रमाणे त्यांचा मृत्यू होतो. या अवतारांपैकी बलरामाचे मंदिर असायचे. इसवी सन पूर्व काळात तशी मंदिरे होती हे काही शीलालेखांवरून कळते. तसे एकही मंदिर मात्र सापडलेले नाही.
     मानवी अवतारांची शिल्पे मात्र अनेक ठिकाणी दिसतात. विष्णूच्या अन्य आयुधांबरोबर त्या त्या अवताराचे विशेष शस्त्र त्याच्या एका हातात धरलेले असते. काही शिल्पात तो सपत्नीकही असतो. बलरामाच्या हातात नांगर, परशुरामाच्या हातात परशु, रामाच्या हातात कोदंड (त्याचे धनुष्य) आणि बाण, कृष्णाच्या हातात सुदर्शन तर अन्य बुद्ध मूर्ती प्रमाणे बुद्ध दिसतो. हातात तलवार घेऊन घोड्यावर बसलेल्या आणि रणांगणावर निघालेल्या स्वाराच्या रूपात कल्कीचे शिल्पांकन आढळते.रानी की बाव हे विष्णूचेच मंदिर असल्यामुळे यातील भिंतींवर अन्य देवदेवतां बरोबरच प्रामुख्याने विष्णूच्या अनेक रूपांचे दर्शन होते.

परशुराम :

    दशावतारांत सहावा अवतार म्हणून परशुरामाची गणना करतात. ऋषी जमदग्नी व राजकन्या रेणुकेपासून ब्राह्मणवंशात झालेला हा मुलगा धनुर्वेद व परशु चालविण्यांत निष्णात असून क्षत्रियांचा शत्रू होता. दक्षिण भारताशी याचा बराच संबंध होता, विशेष करून कोंकणपट्टी यानेच बसविली असे मानतात. तेथे आजही भार्गवरामांचे स्थान आहे.
   उत्तरभारतांत परशुरामाच्या स्वतंत्र पूजेचा फारसा प्रघात नाही व त्यामुळे दशावतार मालिकेत जरी याचे दर्शन घडत असले तरी स्वतंत्र प्रतिमा, अगदी मोजक्या आहेत. यादृष्टीने ग्वाल्हेर जवळ मिळालेली गुप्तकालीन प्रतिमा फारच महत्त्वाची आहे. येथे परिपुष्ट शरीराचा द्विभुज परशुराम उजवा हात कमरेवर ठेवून उभा आहे. त्याचा डावा हात जमिनीवर टेकलेल्या विशाल परशूवर विसावलेला दिसत आहे. ब्राह्मणाला आवश्यक जटा वगैरे लक्षणें येथें नाहीत.




  डॉ. कल्पना देसाई यांनी गुजराथच्या तिम्बा गावांत मिळालेल्या एका दुसऱ्या गुप्तकालीन परशुराम प्रतिमेचा ओझरता उल्लेख केला आहे.
बृहत्संहिता परशुराम प्रतिमेचा उल्लेख करीत नाही. मात्र विष्णुधर्मोत्तरपुराणाच्या मते द्विभुज भार्गवरामाच्या हातांत परशु असावयास पाहिजे.

राम :

   रामकथेच्या प्राचीनतेबद्दल संदेह नसला तरी रामोपासना सुद्धा तितकीच प्राचीन असेल असे मात्र सांगता येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे असें कीं रामकथादृश्यें असलेली कोणती ही गुप्तकाळापूर्वीची कलाकृती अजून तरी आपणांस माहित नाही. स्वतंत्र अशी रामाची मूर्ती तर गुप्तकालांत देखील मिळत नाही. मात्र ती घडविण्याविषयी उल्लेख बृहत्संहिता व विष्णुधर्मोत्तरपुराण या दोन्ही ग्रंथात आढळतात. या काळातील खाली नोंदलेली रामकथा दृश्यें महत्त्वाची आहेत :
१) देवगढ येथें अहिल्योद्वारा, वन गमन अत्रीच्या आश्रमांत रामाचे येणें, शूर्पणखेंची दुर्गती, दंडकवनांत राम, सीताहरण, राममारूती, वालिसुग्रीव युद्ध, किष्किंधेत लक्ष्मण, अशोकवनांत सीता, मृतसंजीवनीचा शोध, वगैरे अनेक प्रसंग चित्रित होते.
२) भारतकला भवन वाराणसी येथे तेथूनच मिळालेल्या एका शिळापट्टावर सेतुबंधाचे दृश्य आहे.
३) येथेंच काही मृ‌फलकांवर राम नावेतून नदी ओलांडतांना दाखविला आहे.
४) जुन्या श्रृंगवेरपुरांतून मिळालेल्या एका शिळापट्टांवर वानरांसह राम, लक्ष्मण उभे दिसतात."
५) मध्यप्रदेशाच्या नचना गांवातून मिळालेल्या मृफलकांवर राम, लक्ष्मण, सीता आणि शूर्पणखा, सुग्रीवास अभयदान, सीता व रावण इत्यादी कथादृश्यें अंकित आहेत. "
६) श्रावस्तीत मिळालेल्या व तूर्त लखनऊ संग्रहालयात असलेल्या एका मृफलकांवर सुग्रीव व विरूपाक्षाचे युद्ध दर्शनीय आहे.
७) बिहारमध्ये चौसा व अफसाद या गावांतून बरेचसे रामकथा-मृदफलक मिळाले आहेत."
८) वानरांसह राम लक्ष्मण अंकित करणारा पटना संग्रहालय येथील मृफलक. 
९) झझ्झर (हरियाणा) येथील अभिलिखित मृझलक. 



श्रीरामाच्या काही मुर्ती

   यावरून हें स्पष्ट दिसते की मंदिरांच्या किंवा घरांच्या भिंतीवर रामकथेची दृश्यें अंकित करावयाची पद्धत बरीच जुनी होती. भासाच्या 'प्रतिमा' नाटकांत तिचे अस्तित्व पहावयास मिळतेच.

शिल्प रामायण

रामायण Ramayan Ram Lakshman Sita राम
सर्व देवांनी भगवान विष्णूचा धावा केला
 
ब्रम्हा आणि महादेव यांच्याकडून रावणाने वरदान मिळवले आणि त्याच्या जोरावर त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरु केले. सर्व राक्षसांनी हाहाकार माजवला होता. सर्व त्रस्त देव भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागायला गेले.

भगवान विष्णू यांनी सर्व देवांना सांगितले की ते राजा दशरथाच्या घरी जन्म घेतील आणि रावणाचा वध करतील.

राजा दशरथ याने ऋषी शृंगमुनी यांच्याकडून पुत्रकामेष्ठी यज्ञाचे अनुष्ठान केले.
राजा दशरथाला तीन पत्नी होत्या. अनुष्ठान केल्यानंतर
कौशल्येला राम नावाचा पुत्र झाला, कैकयीला भरत तर सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न नावाचे दोन पुत्र झाले. दशरथाचे चारही राजपुत्र वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेऊन अयोध्येत परत आले.
विश्वामित्र राजा दशरथाकडे यज्ञाची रक्षा करण्यासाठी विनंती करताना
विश्वामित्र, राम व लक्ष्मण
तपोवनात विश्वामित्र यज्ञ करीत होते पण त्यांना सुबाहू नावाचा राक्षस त्रास देत होता. म्हणून विश्वामित्र यज्ञाची रक्षा करण्यासाठी दशरथाकडून राम लक्ष्मण यांना घेऊन आपल्या आश्रमात आले.
राम व ताडका युद्ध
 
आश्रमात जात असताना वाटेत ताडका नावाच्या असुरी स्त्रीने त्यांची वाट अडवली. रामाने आपल्या बाणाने तिचा वध केला.
सूबाहू वध
 
विश्वामित्राच्या आश्रमात यज्ञाला सुरवात झाली. सुबाहुने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. रामाने त्याचा वध केला.
राज जनक, विश्वामित्र, राम व लक्ष्मण
 
    रामाचे आश्रमातील कार्य संपन्न झाले. राजा जनकाने विश्वामित्र यांना आपल्या मुलीच्या म्हणजे राजकुमारी सीतेच्या स्वयंवरासाठी आमंत्रण पाठविले होते. विश्वामित्र राम व लक्ष्मण यांच्यासह मिथिला नगरीत गेले जेणेकरून राम व लक्ष्मण हा सोहळा पाहतील.
प्रत्यंचा चडवित असताना राम व समोर सीता
 
मिथिला नगरीत स्वयंवराला सुरवात झाली. राजा जनकाची एकच अट होती, सभेच्या मध्यभागी ठेवलेल्या शिवधनुष्यावर जो कोणी पुरुष प्रत्यंचा चडवेल त्याच्या सोबत सीतेचा विवाह होईल. सर्व विरपुरूषांनी प्रयत्न केला पण ते धनुष्य कोणीही उचलू देखील शकले नाही. रामाने त्या धनुष्यावर प्रत्यंचा चडवली पण पण प्रत्यंचा चडवीत असताना ते भंगले. अटीप्रमाणे सीतेचा विवाह रामाशी झाला.
रामाचा राज्याभिषेक
 
राम आणि सीता अयोध्येत आले. राजा दशरथाने रामाचा राज्याभिषेक केला आणि आता राम अयोध्यानरेश झाले.
राम सीता लक्ष्मण
कैकयीला राजा दशरथाने तिच्या कोणत्याही दोन इच्छा पूर्ण करण्याचे वरदान दिले होते. त्याच्या अनुषंगाने कैकयीने इच्छा सांगितल्या की भरत अयोध्येचा राजा व्हावा आणि रामाने चौदा वर्ष वनवास भोगावा.
कैकयीच्या म्हणण्यानुसार राम वनवासाला निघाले सोबत अर्धांगिनी सीता व भाऊ लक्ष्मण देखील आले.
शुर्पणखेचे नाक कापताना लक्ष्मण

वनातील ऋषीमुनींचा आशीर्वाद घेत राम, लक्ष्मण व सीता पंचवटीत येतात जिथे त्यांची भेट जटायूशी होते. पुढे ते पंचवटीत पर्णकुटी बांधून त्यांची दिनचर्या सुरू करतात.
त्यादरम्यान एक सुंदर स्त्री रामाचे सौंदर्य पाहून त्याच्याशी लग्नाच्या इच्छेने पर्णकुटीत येते. राम आणि लक्ष्मण दोघे तिच्या प्रस्तावाला ठोकर मारतात म्हणून ती सीतेला खायला जाते तेंव्हा अगस्ती ऋषींनी दिलेल्या तलवारीने लक्ष्मण तिचे नाक कापतो. हीच ती रावणाची बहिण शुर्पणखा. कापलेले नाक घेऊन खर दूषण नावाच्या तिच्या भावांकडे कडे जाते. बहिणीचा झालेला अपमान पाहून दोघे क्रोधित होतात व रामाशी युद्ध करतात. राम दोघांचा वध करतो.
सुवर्ण मृग
 
शुर्पणखा ही वार्ता घेऊन रावणाकडे जाते. आपल्या अपमानाचा बदला रावणाने घ्यावा म्हणून शुर्पणखा रावणाला खोटा वृत्तांत सांगते. रावण मारीच नावाच्या राक्षसाला मायावी रूप घेऊन राम लक्ष्मण यांचे लक्ष विचलित करायला सांगतो. मारीच सुवर्णमृगाचे रूप घेतो आणि सीतेला त्याची भुरळ पडते.
मारीच वध
 
सीतेच्या हट्टापायी राम आणि लक्ष्मण त्या हरणाच्या मागे जातात. राम मारीच राक्षसाला मारतो.
रावण सीतेचे हरण करताना
 
इकडे रावण साधूचे रूप घेऊन भिक्षा मागायला येतो. भिक्षा घेण्याच्या निमित्ताने रावण सीतेला लक्ष्मण रेषेच्या बाहेर बोलवतो आणि तिचे हरण करतो.
रावण आणि त्याच्या पायाशी जटायू
 
सीतेला आपल्या विमानात बसवून रावण नेत असतो ते जटायू बघतो आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. दोघात युद्ध होते आणि जटायू जखमी होतो.
जखमी जटायू रामाला सर्व घटना सांगतो आणि जटायूचा मृत्यू होतो. जटायूवर अंतिम संस्कार करून राम सीतेच्या शोधत निघतो.
पुढे कबंध नावाच्या गंधर्वाकडून समजते की रावण सीतेला दक्षिणेकडे घेऊन गेला आहे.
राम हनुमान भेट
 
दक्षिणेचे मार्गक्रमण सुरू असताना वाटेत त्यांना हनुमान भेटतो. तो राम आणि लक्ष्मण यांना सुग्रीवकडे घेऊन जातो. सुग्रीव त्याची व्यथा रामासमोर मांडतो आणि बाली कडून आपले राज्य परत मिळवण्यासाठी मदत मागतो.
सातही वृक्षांना एकाच बाणात छेदताना

रामाच्या शक्तीवर त्याचा विश्वास नसल्याने तो रामाला ताडाचे सात झाड एका बाणात पडायला सांगतो. राम जेंव्हा ते सातही वृक्ष पाडतात तेंव्हा सुग्रीवाला विश्वास बसतो आणि तो बालीला युद्धासाठी पुकारतो.

सुग्रीवचा राज्याभिषेक

पुढे सुग्रीव बाली युद्धात राम बालीचा वध करतात आणि सुग्रीवाला किष्किंधा नगरीचा राजा बनवितात. राम स्वतः सुग्रीवाचा राज्याभिषेक करतात आणि अंगदाला युवराज घोषित करतात.

श्रीराम हनुमानाला अंगठी देताना
 
रामाच्या आज्ञेने वानरसेना सीतेच्या शोधात निघते. श्रीराम हनुमानाला आपली एक अंगठी देऊन सांगतात की, सीतेला ही अंगठी दाखव जेणेकरून ती तुझ्यावर विश्वास ठेवेल. वानर सेनेला संपाती म्हणजेच जटायूचा मोठा भाऊ भेटतो जो वानरसेनेला सीता लंकेत असल्याची माहिती देतो.
सीता आणि हनुमान भेट 
 
जांबुवंत व अंगद, हनुमानाला त्याच्या असीम शक्तींची आठवण करून देतात आणि समुद्र लांघुन लंकेत सीतेच्या शोधासाठी जाण्यास सांगतात. हनुमान लंकेत जातो आणि श्रीरामाची अंगठी दाखवून सीतेला आपली ओळख पटवून देतो.
दशानन रावणासमोर हनुमान 
 
नंतर हनुमान अशोक वाटिकेची नासधूस करतो. हनुमानाला पकडण्यासाठी रावणाचा मुलगा मेघनाद येतो आणि हनुमानाला नागपाशात बांधून रावणासमोर नेतो.
रावण हनुमानाच्या शेपटीला आग लावायची आज्ञा देतो आणि मग हनुमान जळत्या शेपटीने लंकेला आग लावतो.
हनुमान रामाला भेटून सीतेची हकीकत सांगतो आणि राम वानरसेनेसह लंकेत जाण्यासाठी समुद्रकिनारी येतात. तिथे शिवाचे पूजन केले जाते. हेच ते तामिळनाडू मधील रामेश्वरम्.

 

सेतू बांधून श्रीराम लंकेत प्रवेश करतात. रावण आपल्या शक्तीने राम आणि लक्ष्मण यांचे शरीरापासून वेगळे केलेले डोके सीतेला पाठवतो जेणेकरून सीता त्याची होईल, पण नंतर रावणाची ही चाल सीतेच्या लक्षात येते.
पहिल्या रकान्यात अंगद व रावण
श्रीराम युवराज अंगदाला शांतीदूत म्हणून रावणाच्या सभेत पाठवतात. तिथे योग्य आसन न मिळाल्याने अंगद आपल्या शेपटीने स्वतःसाठी योग्य आसन तयार करतो.
रावण आपल्या अहंकारात पुरता बुडाला असल्याने अंगदाचा शांतीप्रस्ताव मान्य करत नाही.
 
वानरसेना आणि रावण यांच्यात युद्ध सुरू होते. प्रचंड जिवीतहानी झाल्याने स्वतः रावण युद्धासाठी सज्ज होतो. पण श्रीरामासमोर त्याचा टिकाव लागत नाही व त्याचा पराजय होतो.
मधल्या रकान्यात कुंभकर्णाला झोपेतून जागे करताना

रावण आपल्या सैन्याला आदेश देतो की कुंभकर्णाला झोपेतून जागे करा. रावणाच्या आज्ञेने कुंभकर्ण युद्धात उतरतो आणि हाहाकार माजवतो.

युध्दात तो वानरसेनेला पायदळी तुडवत होता. नंतर श्रीराम स्वतः कुंभकर्णाचा वध करतात.
दशानन रावण
त्यांनतर युध्दात रावणाचा मुलगा मेघनाद उतरतो. श्रीराम त्याचा देखील वध करतात.
मुलाच्या आणि भावाच्या शोकात बुडालेला रावण पुन्हा युद्धास सज्ज होतो. आपल्या रथावर स्वार होऊन तो युद्धात उतरतो.
रथावर आरूढ श्रीराम
इकडे इंद्र आपला रथ श्रीरामांना देतो.
आता युद्ध बरोबरीचे होणार होते. रावणाचे शिर कितीही वेळा वेगळे केले तरी त्याजागी परत नवीन शिर येत होते.
रावणाचा वध
 
बिभीषण सांगतो की रावणाच्या बेंबीत अमृत आहे त्यामुळे तिथे आधी बाण मारा आणि नंतरच तो मरेल. आणि अशा प्रकारे श्रीराम रावणाचा वध करतात.
जय श्रीराम!!!
टिप: सर्व शिल्पं अमृतेश्वर मंदिर, अमृतपुरा, कर्नाटक येथील आहेत

कृष्ण :

     विष्णूचा हा आठवा अवतार सर्वात श्रेष्ठ अर्थात् पूर्णावतार म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णांचा जन्म मथुरेंत झाला, त्याने गोकुळांत बालक्रीडा केली व किशोरावस्थेतच मथुरेचा राजा कंस याला मारून फार मोठा पराक्रम गाजवला. यामुळे साहजिकच व्रजक्षेत्र अर्थात् मथुरेच्या जवळपासचे भाग कृष्णोपासनेचे माहेरघर मानले गेले.
   आजपर्यंत हाती असलेल्या माहिती प्रमाणें श्रीकृष्णांचे प्रथम अंकन भारतीय ग्रीक राजा अगॅथोल्कियस सुमारे (१८०-६५ इ.पू.) याच्या ऐखनूम येथून मिळालेल्या सहा ब्रोंझच्या नाण्यावर दिसते. या नाण्यांवर ब्राह्मी व ग्रीक भाषेत राजाचे नाव असून एका बाजूला श्रीकृष्ण व दुसऱ्या बाजूला बलरामाची मूर्ती आहे. दोघेही योद्धांच्या वेषांत आहेत. त्याच्या डोक्यावर छत्रे असून पायांत जोडे, खांद्यावर उपरणी, कानांत कुंडले आणि मस्तकावर मुगुट आहेत. कृष्णाजवळ चक्र व शंख आहे तर बलरामाचे हातांत गदा व मुसळ दिसते. बलरामाचे हातांत गदा व मुसळ दिसते. दोघांच्याही कमरेस तलवारी लटकत आहेत."'
    कुषाणकाळांपासून कदाचित त्यापूर्वीपासूनच, कृष्णलीलेची दृश्यें दगडांवर कोरण्यांची पद्धत व्रजक्षेत्र व त्या परिसरांत विद्यमान होती. लहानग्या कृष्णांस डोक्यावर घेऊन वसुदेवाचे यमुना ओलांडणे (म.सं. १७.१३४४), घोड्याच्या रुपानें आलेल्या केशी दैत्याशी कृष्णाची लगट (म.सं. ५८.४४७६), गोवर्धन धारण (राजस्थानांतून मिळालेले मृझलक)" बलराम कृष्ण व त्यांची एकानंशा या प्रतिमा (रे. चि. पंधरा ६) अशी कित्येक दृश्यें आज आपणांस माहित आहेत. असे जरी असले तरी या काळांत श्रीकृष्णांच्या स्वतंत्र प्रतिमा नसाव्यात असे मानण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. ही विचारसरणी तर्कशुद्ध नाही. थोडक्यात तिची साधकबाधक चर्चा करू.
    आज साधारणपणे कृष्णाची प्रतिमा म्हणजे रांगत्या बाळकृष्णांची किंवा तिरका पाय ठेवून वेणू वाजविणाऱ्या मुरलीधराची प्रतिमा अशी सांगड आपण बांधलेली आहे. पण ही दोन्ही रूपें व कृष्णाची 'मधुरा' भक्ती मध्यकाळांत झालेल्या उत्तर व दक्षिण भारतांतील संतांनी आपणांस दिली, प्रेमळ भक्तांनी ती उचलून धरली व तेव्हांपासून अनेक कर्वांनी शाहिरांनी, चित्रकारांनी आणि गवैयांनी ती अमर केली. मग ही रूपें कुषाणकाळांत आपणांस कशी मिळणार? त्यावेळच्या स्थितीचे आकलन करण्यांकरिता आपणांस जुन्या वाङ्मयांची बाडेंच धुंडाळली पाहिजेत.
   या संबंधांत मुख्य प्रश्न असा कीं महाकाव्यें व पुराणांस अपेक्षित असलेला कृष्ण चतुर्भुज होता किंवा द्विभुज ? हा प्रश्न भगवद्‌गीतेची टीका लिहीत असतांना रामानुजाचार्यांच्यासमोर सुद्धा उभा राहिला होता. त्याचे त्यांनी व विष्णुपुरांणांचा टीकाकार विष्णुचित्त यांने जे निराकरण सुचविले ते आपल्या दृष्टीनें महत्त्वाचे आहे. दोघांचाही मथितार्थ असा की कृष्णाचे मूळरूप 'परमार्थतः' चतुर्भजच होय. वसुदेव-देवकी यांच्या प्रार्थनेंमुळे कृष्णाने कंसवधापर्यंत आपल्या दोन हातांना गुप्त ठेवले होते इतकेच, अर्थात् त्याचे मनुष्य रूप द्विभूज व मुख्य रूप चतुर्भुज. ही गोष्ट महाभारत, विष्णू, मत्स्य, लिंग, ब्रह्म, पद्म, वगैरे पुराणग्रंथाची छाननी केल्यास ही स्पष्ट होते. शंख, चक्र, गदा, किंवा शंख, चक्र, गदा व धनुष्य अथवा तलवार घेतलेल्या चतुर्भुज कृष्णांचे कित्येक उल्लेख आपणांस आढळतात. गुप्तकाळांपर्यंत कृष्णांच्या मूळ रूपांस अर्थात् परमार्थिक रूपांस म्हणजेच चतुर्भुज रूपांस जास्त मान्यता होती हे मानावे लागेल याप्रमाणे संगती लावल्यास मथुरेहून मिळणाऱ्या व शंख-चक्र-गदा धारण करणाऱ्या विष्णुमूर्तीतच वासुदेव कृष्णाला शोधले पाहिजे.
    वरील निष्कर्ष सुदैवानें प्रत्यक्ष प्रमाणांने देखील सिद्ध होतो तो असा. काही वर्षांपूर्वी  मथुरा संग्रहालयासाठी एक कुषाणकालीन शिलापट्ट विकत घेतला (म.सं.सं. ६७.५२९ रे. चि. पंधरा ६) त्यांत एका स्त्रीमूर्तीच्या आजुबाजूस दोन चतुर्भुज मूर्ति कोरलेल्या आहेत. त्यापैकी डावीकडून प्रथम प्रतिमेच्या कानांत एकच कुंडल असून मागील हातात गदा व सिंहलांगल आहे. स्त्रीमूर्तीच्या उजवी कडील प्रतिमा गदा व चक्र घेतलेली अर्थात विष्णूंची आहे. एक कुंडल व सिंहलांगल यामुळे बलराम सहज ओळखतां येतो बलराम व वासुदेव विष्णू अर्थात् कृष्ण यांच्यामधील स्त्रीमूर्ती एकानंशेची असली पाहिजे हे लक्षण ग्रंथांवरून सहज ताडता येते. एकानंशा ही कृष्ण व बलराम यांची बहीण होती. या त्रिवर्गाच्या प्रतिमेला पुरेसे वाङ्‌मयीन आधार आहेत. अशा प्रकारच्या इतरही कृषाणकालीन प्रतिमा मथुरा संग्रहालयांत आहेत. वासुदेव विष्णू किंवा कृष्णाला चतुर्भुज दाखवीत असत हे या मूर्ती सहज सुचवतात. (उदाहरणार्थ रे. चि. तेरा १, यांत जवळची एकानंशा दाखविलेली नाही.) वीणकार की
   जैन शास्त्रांप्रमाणे तीर्थकर नेमिनाथाचे पार्श्वचर म्हणून यदुवंशातील बलदेव व वासुदेव किंवा नारायण यांना दाखवितात. कुषाणकालीन नेमिनाथाच्या कित्येक प्रतिमांतही वासुदेव गदा चक्र घेतलेला चतुर्भुजच दाखविला आहे.




    चतुर्भुज वासुदेव किंवा कृष्णाचे अंकन गुप्तकाळातही चालत असे. गढवा येथून मिळालेल्या भीम-जरासंध युद्धांच्या एक दृश्यांत (ल.सं.एच् ८८) भारतीय कथेप्रमाणे दर्शक म्हणून अर्जुन व कृष्ण उपस्थित आहेत. येथे कृष्ण स्पष्टपणे चतुर्भुज आहे. देवगढ येथून मिळालेल्या व आज प. बर्लिनमध्ये असलेल्या एक शिळाखंडावर धनुर्धर अर्जुनाचेजवळ चतुर्भुज श्रीकृष्ण आसनांवर बसलेला आहे. " अर्थात् गुप्तकाळांत ही परंपरा जिवंत होती असे म्हणावे लागेल. कृष्णलीला दृश्यांत मात्र बऱ्याच ठिकाणी तो द्विभुज दाखविला आहे.
    कुषाण काळांतील कृष्णलीला-दृश्यांचा वर उल्लेख आला आहे; गुप्तकाळांतील अशा प्रतिमांचा थोडक्यांत आढावा घेऊ, अशी प्रमुख शिल्पें निम्नलिखित आहेत.
१) देवगढ (झाशी) येथील नंदयशोदजवळ कृष्ण बलराम, शकटासुर वध, कृष्ण-सुदामा, वगैरे
२) भारतकला भवन, वाराणसी येथील रांगता कृष्ण व यशोदेचे दधिमंथन.
३) श्रावस्ती येथील यशोदा कृष्ण, एक मृफलक (ल.सं.सं. ६७.१२४).
४) एरण (मध्यप्रदेश) येथून मिळालेली यमलार्जुन, कालियादमन, यशोदाकृष्ण, वगैरे दृश्यें.
५) जोधपूरजवळ मण्डोर येथून मिळालेल्या केशीवध, प्रलंबवध, चोरी, वगैरेचे दर्शन घडविणारे खांब."
६) वलभी (सौराष्ट्र) येथून हाती आलेली केशीवध करणाऱ्या कृष्णाची खंडित प्रतिमा.
७) काठमांडू (नेपाळ) च्या बसंतपूर महालात असलेली कालियादमन करणाऱ्या कृष्णाची मूर्ती. थोडे नंतरचे हेच दृश्य मथुरेंतही मिळते.
८) वरील सर्व दृश्यांपेक्षा कृष्णाचे गोवर्धन धारण हे दृश्य जास्त लोकप्रिय असावे असे वाटते. गोवर्धनधारी कृष्णाची एक विशाल प्रतिमा भारतकला भवन, वाराणसी येथे आहे. हेच दृश्य मंडोर (राजस्थान) येथून मिळालेल्या एका शिळापट्टावर आहे. हे कथादृश्य मध्य आशियात मिळालेल्या एका मडक्याच्या तुकड्यावर सुद्धा अंकित केलेले हाती आले आहे.
९) याशिवाय भीतरगांवच्या इष्टिका मंदिरावर असलेली कृष्ण-कथा-दृश्यें उदा. केशीवध, कृष्णांची कुवलयापीडाशी झुंज, एका दैत्यांस गुद्दे मारणे, कंसवध या प्रसंगानें उल्लेखनीय आहेत.
१०) याच संदर्भात इकडे तिकडे विखुरलेल्या चौकोनी दगडी खांबाकडेही लक्ष पुरविले पाहिजे, ज्यांच्या चारी बाजूला लहान लहान चौकटीतून कृष्णलीलांची बारकी दृश्यें कोरलेली असतात. 'Krsnalila oblisques' म्हणून ओळखले जाणारे हे लहान मोठे खांब गुप्तकाळांपासून मध्यकाळाच्या शेवटपर्यंत कोरले जात असत.
    वर नोंद केलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या कृष्ण लीला दृश्यांचा साकल्यानें विचार केला तर एक गोष्ट अगत्याने लक्षांत येते की सर्व कथा दृश्यें बव्हंशी कृष्णाच्या बालचरित्राशीच संबंद्ध आहेत. त्यानंतरची दृश्ये फारच मोजकी आहेत. साहजिकच वर सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण पुढच्या काही दृश्यांत तो आराध्यरूपांत किंवा मोठेपणी चतुर्भुज रूपांत दिसतो. म्हणून कुषाणकाळांप्रमाणेच गुप्तकाळांतील चतुर्भुज विष्णूंच्या प्रतिमांतच कृष्णास शोधावयास हवे.

बलराम :
   विष्णूच्या चार व्यूहांमध्ये संकर्षण किंवा बलरामाची गणना होते. त्याला शेषावतार असेही मानतात. पण या शिवाय 'कृष्णस्तु भगवान् स्वयम्' असें गृहीत धरून त्याला विष्णूचा आठवा अवतार म्हणूनही ओळखतात. शेषाचा अवतार, व कृष्णाचा मोठा भाऊ या नात्यानें याला मान्यता प्राप्त होती. गदायुद्धाचे आचार्यत्व, नांगर व मुसळ या शस्त्रांना हाताळण्यांची हातोटी व मद्याची आवड ही बलरामांची वैशिष्ट्ये होत. डाव्या किंवा उजव्या कानांत एकच कुंडल घालणें व निळे वस्त्र नेसणें गौरवर्ण बलरामाची व्यक्तिगत आवड होती. त्याचे एकच कुंडल गुप्तकाळांपर्यंतच्या शिल्पांत प्रामुख्याने दिसते (चित्र १७).
भारतीय ग्रीक राजा अगॅथोक्लियस यांच्या ऐखनूम इथूिन मिळालेल्या नाण्यावर असलेले कृष्ण बलरामाच्या मूर्ती

 मथुरा, वाराणसी व ग्वाल्हेर या भागांत बलरामाचे पूजन शुंग काळांपासूनच चालू होते. एवढंच नव्हे तर बलराम व कृष्णाने उत्तर-पश्चिमेंकडे भारताच्या सीमा ओलांडल्या होत्या हे भारतीय ग्रीक राजा अगॅथोक्लियस यांच्या ऐखनूम इथूिन मिळालेल्या नाण्यावरून सिद्ध होते. कृष्ण बलरामाच्या मूर्ती असलेल्या या नाण्यांचा उल्लेख मागे झालाच आहे. शुंग काळातील बलरामाच्या दगडी प्रतिमा जनसुती (मथुरा) (चित्र१५), काशी व तुमैन (ग्वाल्हेर) या ठिकाणी मिळाल्या आहेत. या काळांत नांगरमुसळ घेतलेल्या बलरामाचे रूप द्विभुज असून दोन ठिकाणी त्याच्या डोक्यांवर साप आढळतो.

शिल्पांचे वर्गीकरण :

   बलराम पूजनाची परंपरा कुषाण काळांत बरीच वाढीस लागली. ब्राह्मणधर्माबरोबरच या काळांत बलरामाला जैन धर्मात देखील मान्यता मिळाली. त्याची घडण ब्राह्मण बलरामांसारखीच आहे. कुषाण बलरामाच्या एकूण २६ मूर्ती आपणांस माहीत आहेत. हातांची संख्या सापांचे अस्तित्व व आयुध भेद या आधारांवर या प्रतिमांना मुख्यतः चार गटांत वाटतां येईल :

    गट - १: डोक्यावर फणाटोप किंवा सर्पफणा, उजवा हात उगारलेला तळहात उघडा व डाव्या हातांत मद्याचा पेला. हा गट कुषाण काळांत सर्वाधिक लोकप्रिय होता. (रे.चि. सतरा ६) यांच्या सोळा प्रतिमा आपणांस माहीत आहेत. या पद्धतीच्या मथुरा संग्रहालयांत असलेल्या उपप्रकारांत मागील बाजूस आयुधेही कोरलेली दिसतात.

    गट -२ : डोक्यावर फणाटोप, उजवा हात अभयमुद्रेत व डाव्या हातांत नांगर.

   गट - ३ : फणाटोपाशिवाय चतुर्भुज मूर्ती. या प्रकारांत बहुतेक बलरामाच्या हातांत सिंहांकित नांगर (हिलांगल) व गदा असते. अशा प्रकारच्या चार प्रतिमा मिळाल्या आहेत (चित्र १७). या गटाचा उपप्रकार म्हणजे गदेच्या ऐवजी मुसळ असणें हा होय. याच गटाचा तिसरा उपप्रकार कोण्डामोतूच्या शिळापट्टांवर आहे. येथे बलराम द्विभुजच आहे.

 गट -४ : हा मूर्तीचा वेगळा असा प्रकार नसून यांत बलरामांचा अन्य देवतांशी संबंध दिसतों. उदा. चतुर्व्यहांत बलराम (रे.चि. सोळा ३), कृष्ण व एकानंशेसह बलराम (रे.चि. पंधरा ६) व तीर्थंकर नेमिनाथाचा पार्श्वचर बलदेव (चित्र १७).

कुषाण बलरामांची कांही वैशिष्ट्यें :

पागोटें किंवा उष्णीष :

    कुषाण काळापर्यंतच्या सर्वच प्रतिमांमधे हैं आढळतें (रे. चि. सतरा १,२), मात्र कुषाणकाळांत मधल्या बदामी तुऱ्याच्या आजुबाजूला एक एक अतिरिक्त तुराही लावलेला दिसतो (रे.चि. सतरा ३,५).

साप :

     बल्गाम हा शेषावतार असल्यामुळे वरील तिसरा गट सोडल्यास इतर प्रतिमांत त्याचे डोक्यावर सर्पफणा किंवा सगाटोप आहेतच. कुषाण कलेत सांपाचे सर्वसाधारण अंकन करीत असताना काही गोष्टींकडे बारकाईनें लक्ष पुरबिले नाई अर्थात् बलराम शिल्पेही त्याला मुळीच अपवाद नाहीत. या गोष्टी म्हणजे
 १) समोरून फक्त फणा दिसत असली तरी पाठीमागे पुरता साप कोरलेला असतो (रे. चि. चाळीस २,५).
२) कधी सापाचे सरीर (आभोग) खांगासारखें उभे दिसते (रे. चि. चाळीस ३,४) व कधी वेटोळ्या दिसतात. खालच्या टोकास शेपटी असते (रे. चि. चाळीस २).
३) सापांचे सारे शरीर लहान लहान वर्तुळे, त्रिकोण, डोळे, तीन कमानी, वगैरे आकृत्यांनी भरलेले असते. कुषाण काळानंतर ही चिन्हे मावळतात. (रे. चि. चाळीस ५)
४) मस्तकामागें असलेली सर्पफणा प्रभा मंडळासारखी दिसते (चित्र. १६).
५) या सर्पफणांच्या वर बहुतेक स्वस्तिक, पूर्णघट, मीनयुगल, श्रीवत्स, वगैरे मंगल चिन्हे आढळतात. हरिवंशही बलरामांचे डोक्यावर असलेल्या स्वस्तिक चिन्हाचे वर्णन करतो ०७ (चित्र. १६२).
६) या काळांतील सर्वच सांपाच्या तोंडातून विषदंत किंवा जिभा बाहेर आलेल्या दिसतात.

सिंह :

        बलरामाचे सिंहाशीही जवळचे नाते असावे. त्याचे नांगरावर सिंहाची आकृती दिसते. म्हणूनच त्याला सिंहलांगल असे म्हणतात. याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. एका कुषाण शिल्पांत बलरामांच्या एकुलत्या एक कुंडलांत सिंहाची आकृती खुबीने वापरलेली आहे. (म.सं.सं.सी. १५, चित्र १६) पुढें मिळणाऱ्या वैकुंठ मूर्तीत संकर्षण किंवा बलरामांचे प्रातिनिध्य सिंहमुखानेंच झालेले आहे (रे.चि. चौदा ४).
         बलराम हा वृष्णिकुळांत जन्मला होता. वृष्णिराजन्यगणाच्या एका नाण्यांवर एक खांब आहे ज्याचा वरच्या टोकावर सिंह व हत्ती यांची मिश्रित आकृती दिसते.

आयुधे :

    बलरामांची प्रमुख आयुधे म्हणजे अपराजित किंवा संवर्तक नांवाचा नांगर व सौंनंद नांवाचे मुसळ ही होत त्याचे दुसरे आवडते शस्त्र गदा होते. त्याच्या व विष्णूच्या गदेंत फरक आढळत नाही.

कुण्डल :

   बलरामांचे एक कुंडल हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य होय या मुळेच वाङ्मयात त्याचे उल्लेख 'कान्तैककुंडलधरः', 'वामैककर्णामलकुण्डलश्रीः', 'कुंडलैकधरः', वगैरे स्वरूपांत मिळतात. शिल्प व शिल्पशास्त्र दोघांनाही हे मान्य आहे (रे.चि.सतरा ३).

मद्याचा पेला :

   बलरामाची ही खूण बऱ्याच शिल्पांत आढळते फक्त पेल्याच्या आकारांत व धरण्यांच्या पद्धतीत फरक होतो. (चित्र १६, रे.चि. सतरा ६)

गुप्तकाळांतील बलराम :

   शुंगकाळांतील साध्यासुध्या बलरामानें कुषाणकाळांत तीन गटात वाटली जाण्यासारखी बरीच रूपें धारण केली हे नुकतेच पाहिले. पुढे गुप्तकाळांतील प्रमुख परिवर्तन म्हणजे आपण उल्लेखिलेले गट संख्या एक व दोन यांचे गट संख्या तीनशी झालेले मिश्रण होय. गुप्तकलाकारांनी बलरामाचे नागरूप स्वीकार केले पण ते आता त्याला गदा किंवा मुसळ, नांगर आणि मद्याचा पेला या सह चार हातांचा दाखवू लागले. त्याचा वर उगारलेला साधारण उजवा हात तसाच राहिला.





        दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे आता प्रतिमेच्या क्षेत्रांत वृष्णीवीर बलराम व विष्णूचा व्यूह संकर्षण यांची एकरूपता प्रस्थापित झाली.
     कुषाणकाळांपेक्षा गुप्तकालांत बलरामाची उपासना रोडावू लागली या काळांतील मूर्तीची संख्या बरीच कमी म्हणजे तूर्त माहितीत फक्त सहा एवढीच आहे.
गुप्तकाळांतील अनंताच्या मूर्तीला बलराम प्रतिमेचा अवतार रूपांतील उपप्रकार मानता येईल.

बलरामाची लीला शिल्पें :

    कृष्णलीला-शिल्पांच्या मानांने यांची संख्या फारच थोडी आहे. चन्दौसी (उ.प्र.) येथून मिळालेल्या एका मृफलकांवर बलरामचे प्रलंबासुरांशी युद्ध दाखविले आहे. सीरपूर (म.प्र.) येथे लक्ष्मण मंदिरावर कोरलेल्या एका दृश्यांत बलराम सूत लोमहर्षण याचा वध करीत आहे असें दाखविले आहे. * मांढळ (जि. नागपूर, महाराष्ट्र) येथून 'धेनुकासुर वधमूर्ति मिळाली आहे. '
चन्दौसी (उ.प्र.) येथून मिळालेल्या मृदाफलकांवर बलरामचे प्रलंबासुरांशी युद्ध
 

चातुर्विंशती विष्णुमूर्ती :-

    रानी की वावमध्ये एका स्तरावरील शिल्पपटावर विष्णूची चोवीस रूपे कोरली आहेत. शंख, च गदा, पद्म ही विष्णूची प्रमुख लांछने. यांच्या क्रमवार रचनेला विष्णूच्या अवस्थिती असेही म्हणतात. क्रम कुठून सुरू करावा या बाबत मूर्तिशास्त्रांच्या पुस्तकांमध्ये एकवाक्यता नाही. पद्मपुराणात एकवीस नावांचा आणि त्याच्या आयुधांचा उल्लेख येतो तर परमेश्वरसंहिता आणि अहिरबुधन्य संहितामध्ये बाराच नावांचा उलेख येतो. केवळ रूपमंडन् मध्ये सर्व चोवीस नावांचा उल्लेख येतो. काहींच्या खालच्या उजव्या हातापासून सुरुवात करावी असे आहे तर काही शास्त्रात ती विष्णूच्या वरच्या उजव्या हातापासून केलेली दिसते. या चार आयुधांच्या अदलाबदलींची रचना ही एकूण चोवीस प्रकारात होउ शकते. यावरूनच या रचनेप्रमाणे विष्णूची चोवीस नावे होतात. ज्याचे संध्ये मध्ये उच्चारण केले जाते. विष्णूची ही चोवीस नावे या प्रमाणे आहेत.
    केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, हृषीकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, बासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नृसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र, हरी आणि कृष्ण.
 बलराम, पाटण
 परशुराम, पाटण
 श्रीराम, पाटण

विष्णूच्या अन्य मूर्ती :-

    या मध्ये परविष्णू आणि विभव या प्रकारच्या मूर्तीचा समावेश होतो. याशिवाय विष्णूच्या काही संहार मूर्ती आणि काही गूढ मूर्तीचाही समावेश आहे.अन्य देवता :-
    रानी की बाव मधील शिल्पे जरी प्रामुख्याने विष्णूची असली तरी अन्य सर्व मंदिरांप्रमाणेच अधिष्ठात्री देवतेचे सोडून अन्य देवदेवतांची शिल्पे येथेही कोरलेली आढळतात. ज्या मध्ये ब्रह्मदेव आणि सावित्री, शंकर-पार्वती, गणपती व ऋद्धी, आणि विष्णू-लक्ष्मी अशी देवतांची युगुल शिल्पे येथे आढळतात. यातील लक्षणीय शिल्पे म्हणजे तप करणाऱ्या पार्वतीची विविध रूपे, अठरा हातांचा भैरव आणि अठरा हातांची महिषासुर मर्दिनी, हनुमान आदी प्रमुख देवतांची शिल्पे दिसतात. तसेच अष्टदिक्पाल आणि नद्यांची शिल्पेही दिसतात.

खजुराहो येथील विष्णूचे प्रमुख मंदिर

लक्ष्मण मंदिर :-
    विष्णूची भव्य मंदिरे ही संख्येनी कमीच आहेत. खजुराहो येथील लक्ष्मण मंदिर याचा यामध्ये प्रामुख्याने समावेश करावा लागेल. हे मंदिर चंदेल घराण्यातील राजा यशोवर्मन याने इ.स. ९५० मध्ये बांधले. याच राजाचे लक्ष्मण हेही नाव असल्यामुळे या मंदिराला लक्ष्मण असे नाव दिले गेले. या देवळामध्ये विष्णूच्या वैकुंठ मूर्तीची प्रतिष्ठापना गर्भगृहामध्ये केली गेली होती. ही विष्णूची अत्यंत वेगळ्या प्रकारची मूर्ती असून तिची गणना विष्णूच्या व्यूह मूर्तीमध्ये होते. ही मूती तोंडाची असून तिची तीनच मुखे दृष्य असणारी समोरील मुख हे मानव रूप असून त्याच्या उजवीकडे नृसिंहाचे आणि डावीकडे वराहाचे मुख आहे. 
 
 लक्ष्मण मंदिर, खजुराहो
 
 वैकुंठ विष्णु, खजुराहो

चार व्युहांची नावे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न अनिरुद्ध अशी असतात (या मूर्तीतील अनिरुध्द मागचे तोंड असते). जयाख्य संहितेमध्ये विश् चतुर्वक्त्र रूपाचे ध्यान करण्याची पद्धत दिली. ज्यामध्ये वैकुंठ, नरसिंह, वराह आणि कति उल्लेख होतो. यावरून वरील मूर्तीमध्ये वासुदेव म्हणजे वैकुंठ, संकर्षण म्हणजे नरसिंह, म्हणजे वराह आणि अनिरुद्ध म्हणजे कपिल होतो. ज्ञान, बल, ऐश्वर्य, वीर्य, शक्ती आणि तेजस गुण ईश्वरसाधनेतून मानवाला प्राप्त करावयाचे असतात. वैकुंठ विष्णू मूर्तीमध्ये ज्याचा कल्पकतेने समावेश केला आहे. संकर्षणाकडे ज्ञान आणि बल, प्रद्युम्नाकडे ऐश्वर्य आणि वीर्य, अनिरुद्धाकडे शक्ती आणि तेजस आणि वासुदेवाकडे हे सहाही गुण एकत्रितपणे असतात. याशिवाय या चार व्युहांचे बारा उप व्यूह असतात. ते याप्रमाणे १. केशव, २. नारायण, ३. माधव, ४. गोविंद, ५ विष्णू, ६. मधुसुद्ध ७. त्रिविक्रम, ८. वामन, ९. श्रीधर, १०. हृषीकेश, ११. पद्मनाभ, १२. दामोदर. पांचरात्र संहितेमा विष्णूचे अवतार एकेका व्युहामधून होतात असे म्हटले आहे. उदाहरणार्थ मत्स्य, हयग्रीव आणि कृष्ण अवतार अनिरुद्ध या व्युहातून निर्माण झालेले आहेत.
    भारतीय मूर्तिशास्त्रातील देवदेवतांच्या मूर्तीचे सर्वाधिक आणि विविध प्रकाराचे शिल्पाकंन  खजुराहोमधील मंदिरात पाहायला मिळते. यातील काही मूर्ती तर इतक्या दुर्मिळ आहेत की त्या जगात अन्यत्र कोठेही दिसत नाहीत. खजुराहो मध्ये इ.स. ९०० ते इ.स. १०५० या कालखंडात लहान मोठी अशी ८५ मंदिरे बांधली गेली असे सांगतात. यापैकी आता केवळ दहा बाराच मंदिरे शिल्लक राहिलेत आहेत.
    लक्ष्मण मंदिराच्या बांधकामाने तेथील मंदिर स्थापत्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला. कारण या पूर्वी फार मोठी मंदिरे तेथे बांधली गेली नव्हती. या नंतर विश्वनाथ, खंडारीया महादेव आणि वैद्य ही मोठी मंदिरे बांधली गेली ज्यापैकी वैद्यनाथ मंदिराचा केवळ पायाच शिल्लक आहे. लक्ष्मण मंदीर हे भारतीय स्थापत्याच्या परिपूर्ण अवस्थेतील मंदिरांमध्ये गणले जाते. ज्याचे समोरून आत जाताना अर्धमंडप, मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे पाच भाग पडतात, तर खालून वर त्याची रचना जगती, पीठ अधिष्ठान यांचा पाया, त्यावर मंडोवर, जंघा (भिंती) त्यावर उतुंग असे शिखर त्यावर आमलक आणि वरती कलश अशी रचना दिसते (कृष्ण देवः १९६९). याच्या प्रत्येक भागावर क्रमशः उंचीवर जाणारी शिखरे असून गर्भगृहावरील शिखर हे सर्वोच्च आहे. हे मंदिर सुमारे दहा फूट उंचीच्या चौथऱ्यावर बांधले असून त्याची लांबी शंभर फूट, रुंदी सत्तर फूट आणि उंची जवळ जवळ शंभर फूट असे प्रचंड मंदिर आहे. हे खजुराहो जवळ असणाऱ्या केन नदीच्या परिसरातील वालुकापाषाणापासून बांधलेले असून दगडामध्ये दगड अचूकतेने खोचत ज्यात कुठेही चुना किंवा अन्य दगड चिकटविण्यासाठी कुठल्याही माध्यमाचा उपयोग न करता हे बांधले गेलेले आहे. अशा बांधकामांना हेमाडपंती म्हणावयाची प्रथा महाराष्ट्रात आहे याचे कारण इ.स. १३ व्या शतकात यादवांच्या दरबारात असणाऱ्या हेमाद्री पंतांनी लिहिलेल्या ग्रंथात या स्थापत्याचा उल्लेख येतो. यावरून या स्थापत्याचा शोध यांनी लावला असा समज दृढ आहे. परंतु हेमाद्रीपंतांच्या हजार बर्षे पूर्वीपासून हे स्थापत्य अस्तित्वात होते.
हृषिकेश, पाटण
 
वासुदेव, पाटण
लक्ष्मण मंदीर , खजुराहो

लक्ष्मण मंदिर हे विष्णूचे मंदिर आहे. एवढेच नाही तर त्या प्रकारच्या मंदिराचे एक अन्य वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे असे म्हणावे लागेल. या मंदिरात विष्णूच्या विविध रूपातील मूर्तीचे दर्शन होत परंतु त्याच बरोबर विष्णुसंकल्पनेच्या वैज्ञानिक सिद्धान्ताचाही आविष्कार झालेला दिसतो. पाट्ण येथील मंदिरात आपण विष्णू हे कालाचे रूप आहे असे पाहिले परंतु विष्णू हा विज्ञानदृष्ट्या दुहेरी भूमिका साकारणारा देव आहे. तो काळाबरोबरच अवकाशाचेही प्रतिनिधित्व करतो. विष्णुपुराण अबकाश हे त्याचे स्थूल आणि सूक्ष्म रूप तर काळ त्याचे पर रूप आहे, असे म्हटले आहे. (विण पुराण, १.२.१४).
  तदेव सर्वमेवैतद्व्यक्ताव्यक्तस्वरूपवत्।
 तथा पुरुषरूपेण कालरूपेण च स्थितम् ।। (विष्णु पुराण, १.२.१४)
    "तो पुरुष आणि काल रुपात असतो. पुरुषाची व्यक्त (स्थूल) आणि अव्यक्त (सूक्ष्म) अशी दोन रूपे असतात आणि काल त्याचे पर रूप होय." (विष्णु पुराण, अनुवाद विल्सन, १८६४, पृ. १८).
      वामन हे या अवकाशाचेच रूप. एक बुटका वामन क्षणात त्रिभुवन व्यापू शकतो हे विष्णूच्या अवकाश व्याप्तीचे दर्शन घडवते म्हणुनच खजुराहोमधील छोट्या मंदिरामध्ये विष्णूचे वामन मंदीरही आहे. या मंदिरातील अधिष्ठात्री देवता वामन असून गर्भगृहात वामनाच्याच बटू मूर्तीची प्रतिष्हाप केलेली आहे. लक्ष्मण मंदिरामध्ये विष्णूचे अवकाश हे रूप साकारण्यासाठी देवालयाबाहेर देवकोष्ठांमध्ये नवग्रहांचे मानुष रूपातील शिल्पांकन पाहायला मिळते. गर्भगृहाच्या समोरून पाहताना डावीकडच्या द्वारशाखेवर खालून वर पाहताना मत्स्य, वराह, बामन या क्रमाने शिल्पे असून उजयी-कडील द्वारशाखेवर कूर्म, नरसिंह आणि परशुराम यांची शिल्पे आहेत. मंदिरातील गर्भगृहाबाहेरील दक्षिणेकडील देवकोष्ठात वराह अवतार, पश्चिमेकडील (मागच्या बाजूकडील) देवकोष्ठात नरसिंह अवतार आणि उत्तरेकडील देवकोष्ठात हयग्रीव अवताराच्या मूर्ती दिसतात. ह्या तीनही मूर्तीच्या वरील उपकोष्ठामध्ये विष्णूच्या तीन अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहेत. बराह अवतारावरील कप्प्यात कूर्मावरील विष्णुयोगेश्वराचे कूर्मनारायणाचे, नरसिंहावरील कप्प्यात विष्णुयोगेश्वराचे विष्णूनारायणाचे, तर हयग्रीवावरील उपकोष्ठात मत्स्यावरील विष्णुयोगेश्वराचे मत्स्य नारायणाचे शिल्पांकन आहे. ही शिल्ये भारतात अत्यंत पवित्र अशा मानल्या गेलेल्या ज्ञानाची आणि ज्ञान परंपरेची प्रतीके आहेत.
 वामन, खजुराहो

लक्ष्मण मंदिरातील विशेष शिल्पे

ज्ञान परंपरेचे महत्त्व :-
    आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा आहे असा सहज उल्लेख केला जातो. परंतु खजुराहोमधील शिल्यांकन पाहिल्यावर गुरुशिष्य ही आपली परंपरा नसून ती शिक्षण पद्धती आहे. परंपरा ही ज्ञानाची किंवा ज्ञानार्जनाची आहे. हे ज्ञान अति पवित्र असते. त्यामुळे ते सगळ्यांना वाटायचेही नसते. इति गुह्यतमं शास्त्रं असे पंधराव्या अध्यायात भगवंताने म्हटले आहे. खजुराहोच्या संग्रहालयामध्ये या वाक्याचे प्रतिनिधित्व करणारे एक अत्यंत दुर्मिळ शिल्प आहे. पद्मासनात बसलेल्या विष्णूने आपल्या डाव्या हाताची तर्जनी तोंडावर ठेवलेली आहे. हे विष्णूनारायणाचे गोप्ता किंवा मौन-व्रती (रहस्यधारी, गुप्तता पाळणारा) हे रूप आहे. अठरा अक्षौहिणीचे विराट सैन्य सभोवती होते त्यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि ज्ञानीही होते. संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान सांगणारे साक्षात भगवंत तेथे होते, तरीही श्रोता मात्र एकच होता. हे ज्ञान एकाने एकालाच द्यावयाचे असते हा संकेत होता.
कूर्म नारायण :-
    समुद्रमंथनाच्या प्रसंगी विष्णूने कूर्माचे रूप घेतले आणि त्या वेळेस त्याने नारदाला काही ऋषींच्या उपस्थितीत ते दिव्य ज्ञान दिले. या शिल्पामध्ये हा प्रसंग दाखवला आहे. कुर्मावरील विष्णू चार हातांचा असून तो पद्मासनात बसलेला आहे आणि त्याचे नैसर्गिक दोन हात ध्यान मुद्रेत आहेत आणि वरील डाव्या उजव्या हातात अनुक्रमे चक्र आणि गदा आहेत. त्याच्या समोर हात जोडून नारद आणि काही तपस्वी बसलेले आहेत. आणि विष्णूच्या मागे सहा ऋषी उभे आहेत.

:कूर्मनारायण, खजुराहो

मत्स्य नारायण :-
   महाप्रलयामध्ये संपूर्ण सृष्टीचा विलय झाला, त्या वेळेस विष्णूने मत्स्याचे रूप घेऊन वैवस्वत मनू आणि सप्त ऋषींना वाचवले. या शिल्पपटात वरील प्रमाणेच ध्यानस्थ विष्णूची पद्मासनातील मूर्ती असून त्याच्या मांडीखाली आसनावर लांब मासा कोरलेला दिसतो. शेजारी अत्यंत वयोवृद्ध मनू हात जोडून बसलेला आहे. ज्याच्या सोबतीला दोन सेवक आहेत. या शिवाय विष्णूच्या मागे सहा उभे आणि पायाशी एक बसलेले असे सात ऋषी - अत्री, वशिष्ठ, कश्यप, गौतम, भारद्वाज, विश्वामित्र आणि जमदग्नी आहेत, ज्यांना सप्तर्षी असे संबोधले जाते.

 मत्स्यनारायण, खजुराहो

विष्णु-नारायण :-
   याचा उल्लेख महाभारतातील एका कथेत येतो. एकदा एकत, द्वित आणि त्रित ह्या नावाचे तीन त्रि शिखंडीन संन्यासी साधू नारायणाचे दर्शन घेण्यासाठी त्याच्याकडे म्हणजे श्वेत द्वीपावर गेले, तेजोमय वातावरणाने त्यांचे डोळे दिपले आणि दृष्टी गेली. त्यांनी तेथे शंभर वर्ष घोर तपस्या केली, ज्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे त्यांना तिथल्या नारायणाच्या साधनेत असलेल्या तेजःपुंज तपस्वींचे दर्शन झाले. अचानक एक प्रखर प्रकाशाचा झोत प्रकटला आणि रमः असे म्हणत ते श्वेत द्विपवासी हात जोडून तिकडे धावले. या तिघांना साक्षात नारायण प्रकटले असल्याचे समजले. परंतु अति जर्जर झाल्यामुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत किंवा त्याला पाहू शकले नाहीत. त्या वेळेस आकाशवाणी होऊन नारायणाने त्यांना दिव्य ज्ञान दिले, जे घेऊन ते परत आले. या शिल्पपटात पद्मासनात ध्यान मुद्रेत बसलेली विष्णूची मूर्ती असून त्याच्या वरच्या डाव्या उजव्या हातात अनुक्रमे शंख आणि चक्र आहेत. त्याच्या मागे सहा श्वेतद्विपावरील ऋषी उभे असून त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे प्रभावळ दाखवली आहे. दोन्ही गुढघे आणि कमरेभोवती योगपट्ट गुंडाळून देवाकडे पाठ करून बसलेला एक ऋषी आहे ज्याचे शरीर खंगून अस्थिपंजर झाल्याचे दाखवलेले आहे. हा त्या तिघांपैकी एक तर दुसरीकडे दोन श्वेत द्विपवासी यांनी मध्ये होम पेटवून ते त्यात आहुती देत आहेत.

योगनारायण, खजुराहो
कृष्ण लीला :-
      या मंदिरामध्ये एकत्रितपणे अनेक कृष्णलीलांचे मनोहारी शिल्पांकन केलेले आहे. गर्भगृहाच्या भोवती आपल्याला ही शिल्पे दिसतात. ही शिल्पे अन्य शिल्पांच्या मध्ये मध्ये कोरलेली आहेत. डावीकडून प्रदक्षिणेला सुरुवात केल्यास १. तृणावर्तवधाचे शिल्प आहे. हा वादळाचे रूप असणारा राक्षस गवताच्या काड्यांचा वेश घेऊन आला. परंतु कृष्णाने त्यास ओळखले व मारले. २. निमिषारण्यामध्ये बलरामाने रोमहर्षणसुताला मारल्याचे शिल्प आहे. ३. कृष्णाने चाणुराला (कंसाचा मल्ल) ठार करतानाचे शिल्प आहे. ४. कुवलयपीड नावाच्या कंसाच्या हत्तीला कृष्णाने ठार मारल्याचे शिल्प आहे. पश्चिमेकडील (मागील बाजूस)
 कृष्णालीला, शकट भंग, खजुराहो

भितीवर ५. कालिया मर्दनाचे यामध्ये मनुष्यरूपी कालिया जो कमरेखाली सर्प रूपात दिसत आहे ठार करतानाचे शिल्प आहे. ६. कृष्णाने शालाला (कसाचा मल्ल) ठार करतानाचे शिल्प त्यानंतर कृष्णाद्वारे कुब्जेचा उद्धार हे शिल्प आहे. ८. शकट भंग - कृष्णाने बैलगाडी तोडताना शिल्प. त्यानंतर उत्तरेकडील भिंतीवरील शिल्पे ९. कृष्णाद्वारे बैल रूपात आलेल्या अरिष्टासुराचा वध केलेले शिल्प आहे. १०. त्यानंतर यमलार्जुन वधाचे शिल्प आहे शापित होऊन वृक्ष रूपात अडकले दोन यक्षांना कृष्णाने ते वृक्ष तोडून मुक्त केले. ११. पुढे पूतनावधाचे शिल्प आहे. तर शेवटी वासराच्या रूपात आलेल्या वत्सासुराचा वध करताना कृष्णाचे शिल्प आहे.

खजुराहोतील अन्य विष्णू मंदिरे

वराह मंडप :-
      लक्ष्मण मंदिरांच्या समोरच एका मंडपाखाली महावराहाचे शिल्प आहे. याला स्वतंत्र वराह जरी म्हटले गेले असले तरीही ज्याप्रमाणे शिव मंदिरासमोर नंदी असतो, विष्णू मंदिरासमोर या मूर्ती स्थापना करण्याची पण पद्धत होती. हा मंडप तंतोतंत जरी या पद्धतीत बसणारा नसला हो साधारण प्रयोजन तसेच दिसते. यामध्ये एक विशाल वराहाचे (त्याची लांबी पावणे नऊ आणि पावणे सहा फूट आहे) शिल्प असून त्याच्या अंगावर असंख्य देव कोरलेले आहेत. यज्ञवराह शिल्पाचे नाव आहे. हे विष्णूचे 'सर्वदेवमय' असे रूप असते. या वराहाच्या पायाखाली एक प्रचंड कासव कोरलेले आहे. आणि वराहाच्या पायांमध्ये शेष सर्प कोरलेला आहे. आदी कुर्मावर शेष त्यावर विष्णू अशी या रचनेची संकल्पना आहे. वराहाच्या डाव्या सुळ्याला धरून उभ्या असलेल्या लक्ष्मीची पूर्णाकृती मूर्ती कोरली होती. आज केवळ तिची पावलेच दिसतात. वरच्या तोंडावा सा
वराह मंडप, खजुराहो

चित्र क्र. ५२ : यज्ञवराह वराह मंडप, खजुराहो

दक्षिण भारतांतील समकालीन विष्णुशिल्पें :

         उत्तरेंतील मौर्य साम्राज्याचा विस्तार दक्षिणेंतही बराच पसरला होता. त्यानंतर महत्त्वाची अशी राजवट सातवाहनांची (सुमारे इ.पू.२००-इ.स.२००). इसवीसनांच्या दुसऱ्या शतकांचे शेवटी कृष्णा नदीच्या खोऱ्यात इक्ष्वाकुराजाचे शासन स्थिर झाले. यांच्या काळांत जरी नागार्जुनीकोंडसारखी बौद्धशिल्पें निर्माण झाली तरी हे राजे मुळांत वैदिक धर्माचे अनुयायी होते. त्यांनी पाषाण व धातुकलेस चांगला प्रश्रय दिला होता. साहजिकच या काळांतील ब्राह्मणधर्माच्या शिल्पांची अपेक्षा करणे चूक होणार नाही. मोजकीच कां होईना पण तसली काही शिल्पें सुदैवाने मिळाली आहेत. यापैकी सर्वात जुनें शिल्प म्हणजे आंध्रप्रदेशांत असलेल्या गुंतूर जिल्ह्यातील कोण्डामोतु या गांवातून हाती आलेला 'पंचवीर पट्ट' होय. (चित्र ७) वृष्णी पंचवीर आणि नरसिंह यांनी युक्त असलेल्या या शिळापट्टाची विस्तृत चर्चा आपण मागे केलीच आहे.
        या नंतरचे म्हणजे वेंगीच्या शालंकायन राजांच्या वेळचे (सु.इ.स. ३५०-४३०) एके शिल्प गुंतूर जिल्ह्याच्याच कुणिदाने नावांच्या गांवातून मिळाले आहे. यांत ब्रह्मदेव व शिवलिंगा बरोबरच सिंहरूपांत नरसिंहाचे दर्शन घडते. कोण्डामोतु-नरसिंहाप्रमाणे जरी याच्याजवळ गदा व चक्र धरणारे मानवस्त नसले जरी त्याचे पाय माणसाचे असून ओटीपोटावर नेसूंच्या वस्त्राची चिन्हे ही आहेत.
          सुमारे तिसऱ्या चौथ्या शतकांत आंध्रप्रदेशातच असलेल्या एका अष्टभुज विष्णूच्या काष्ठशिल्पाचा उल्लेख नागार्जुन कोंड उत्खननांत सापडलेल्या एका शिलालेखांत मिळतो.
         याप्रमाणें आंध्रप्रदेशांत पेरले गेलेले वैष्णव संप्रदायाचे बी हळुहळू रूजू लागले. सुमारे इ.स. ४४०-६१६ मधे राज्य करणाऱ्या 'विष्णुकुण्डिन' वंशाच्या राजाच्या वेळी या प्रदेशातील पेड्डमुड्डीयम् येथून मिळालेल्या कलाकृतीत गणपती, ब्रह्मा, शिवलिंग, देवी, उमामहेश्वर, श्रीवत्सरुपिणी लक्ष्मी व महिषमर्दिनी या बरोबरच विष्णू व नरसिंहाचे दर्शन घडते  विशेष म्हणजे असे की येथे महिषमर्दिनीला सोडून बाकी सर्व देव द्विभुज दाखविले आहेत.



उंडवल्ली येथील विष्णु शिल्पे

        या बरोबरच जवळ जवळ याच काळांतील विजयवाड्याजवळील उंडवल्ली व मोगलराजपुरम् येथील गुहालेणी उल्लेखनीय आहेत. या लेण्यांत वराह, हिरण्यकशिपूशी झगडणारा नरसिंह, त्रिविक्रम व गोवर्धनधारी कृष्णांच्या प्रतिमा आहेत.
          दक्षिण भारताच्या उत्तरेकडील भागांत गुप्तांना समकालीन असे वाकाटकांचे राज्य होते. अजिंठा येथील नंतरची काही लेणी, वेरुळची सुरुवातीची गुहाशिल्पें व घारापुरी आणि औरंगाबादच्या कलाकृती वाकाटक कलेची उदाहरणें होत. यांत वेरूळ येथे त्रिविक्रम, नरसिंह, शेषशायी विष्णू, वगैरे विष्णुशिल्पांवर उत्तर भारतीय कलेची चांगलीच छाप आहे.
 वाकाटककालीन विष्णुमुर्ती ( धर्मापुरी )
 
          पांचव्या शतकाच्या मध्यकाळांत विजापूर जिल्ह्यांत मलप्रभा नदीच्या तटावर वातापिपुर किंवा बादामी येथें पश्चिमी चालुक्य वंशाची राजवट सुरू झाली. सुरुवातीस हे राजे विष्णूंचे उपासक होते पण पुढे ते शिवोपासनेकडेही वळले. बादामी येथील शिल्पांत शेषांवर सुखासनांत बसलेला विष्णू, (निर्माण काल सुमारें इ.स. ५७८) वराहट, नरसिंह, शेषशायी , त्रिविक्रम , वगैरे प्रतिमा उल्लेखनीय आहेत. बादामी बरोबरच चालुक्याचे दुसरे प्रसिद्ध नगर आर्यपूर किंवा ऐहोळे येथील मंदिर-शिल्पांकडेही लक्ष देणें जरूरी आहे. आपण विचारात घेतलेल्या कालखंडाच्या दृष्टीने पहिला पुलकेशिन् (इ.स.५३५-५६६) व मंगलेश (इ.स.५१७-६१०) यांच्या वेळेची मंदिरें महत्त्वाची आहेत विशेषकरून या प्रसंगाने कोंतिगुडी मंदिर समूह व लाडखान मंदिराचा उल्लेख करावयास हवा. या शिल्पांत शिवाप्रमाणें विष्णूच्याही प्रतिमा आढळतात.

दक्षिणेतील विष्णु-शिल्पांची वैशिष्ट्ये :

    गुप्तकाळापर्यंतच्या उत्तरभारतीय विष्णुशिल्पांशी दक्षिणेतील कलाकृतींची तुलना केल्यास खालील गोष्टी ठळकपणें नमूद कराव्या लागतात.
१) इकडे स्थानक, आसन व शयन तिन्ही प्रकारच्या प्रतिमा लोकप्रिय होत्या.
२) विष्णूच्या 'उदबाहू' प्रकारच्या मूर्तीचा विशेष प्रघात असून मागच्या वर उचलेल्या हातांत चक्र व शंख ही आयुधे दिसतात. उत्तरेप्रमाणे इकडे गदा अपरिहार्य नाही. त्यामुळे साधारण दोन्ही हात बऱ्याचदा रिकामेच दिसतात.
३) इतर आयुधांत अक्षमाला क्वचितच दिसते. (ऐहोळेच्या एका अपूर्ण प्रतिमेत ती आहे)  फळ व घट दिसत नाहीत. खड्ग शेषशायी प्रतिमेत कर्धी कधीं आढळते.
४) आयुधपुरुषांना विशेष प्राधान्य नाहीं.
५) दागिन्यांचा विचार केल्यास उत्तरेपेक्षा इकडे दागिने जास्त आहेत. जानव्यासारखा घातलेला जाडजूड दागिना, उदर बंध, गळ्यातील रुंद प्रकारच्या माळा, जाडसर अंगद व कंकणें इकडे बरीच दिसतात.
    लक्ष्मीचे एक प्रतीक म्हणून श्रीवत्स जरी यावेळी इकडे माहित होते,  तरी विष्णूच्या वक्षस्थलांस अलंकृत करण्याकरितां त्याचा उपयोग बरेच दिवसपर्यंत होत नसे.
६) उत्तरेच्या मानानें दक्षिणेत वनमालेचेही प्रामुख्य कमीच दिसते.
७) वराह, शेषशायी, त्रिविक्रम, वगैरे सारख्या काही प्रतिमा वगळल्यास साधारणपणें विष्णुप्रतिमेंत परिवार देवतांचे फारसे दर्शन होत नाही.
८) उत्तरेंत दिसून येणारी विश्वरूप, चतुर्व्यह वैकुंठ, वगैरे रूपें इकडे दिसत नाहीत, पण शेषावर बसलेल्या नारायणांच्या मात्र प्रतिमा एकाधिक मिळतात. अवतारांत वराह, त्रिविक्रम व नरसिंह चांगलेच लोकप्रिय आहेत.
        दक्षिणेतील वराहमूर्तीत ठळकपणें दिसणारी गोष्ट म्हणजे पृथ्वी होय. हिला नृवराहाचे दाढेवर न दाखविता नखरेलपणें कधी सुटी तर कधी त्याच्या मुखाचा आश्रय घेत त्याच्या सामान्य उजव्या हातावर उभी दाखवतात. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तरेंत त्याच्या पायाखाली असणारा नाग येथे सपत्नीक दिसतो व कुठे तर तो समोर हात जोडून उभा असलेला दाखवितात.
     त्रिविक्रमांच्या अंकनात मात्र फारसा फरक नाही. तो अष्टभुज असून त्याने डावा पाय आकाशांकडे उचललेला आहे. खालच्या बाजूला बटु वामनांचे हातांवर राजा बळी दानोदक ओतण्यास तयार आहे. नरसिंहाचे तर येथें एकाधिक प्रकार आढळतात. सिंह-रूपात असणाऱ्या नरसिंहाचे उल्लेख वर आलेच आहेत. याशिवाय उभा राहून हिरण्यकशिपूशी झगडणारा अष्टभुज, त्याला मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडणारा चतुर्भुज , एकटा सुखाने उभा असलेला (केवळ) चतुर्भुज नरसिंह, असे बरेचसे प्रकार दिसतात.
 
अनंतशायी विष्णु, मामल्लपुरम, तमिलनाडु (स्रोत: Purattatva.in
 
९) विष्णूच्या शयनमूर्ती उत्तरेपेक्षा दक्षिणेंत संख्येने जास्त व आकारानें मोठ्या आहेत. उत्तरेपेक्षा येथील नागाच्या वेटोळ्या तर वेगळ्या प्रकारच्या आहेतच पण त्याशिवाय विष्णूचे पाय चुरणारी लक्ष्मी व त्याच्या नाभीतून निघालेले कमळही येथे दिसत नाही. बदामी व ऐहोळे येथे त्याचे पाय सरळ पसरलेले नसून आढी घातलेले आहेत, या मूर्तीत उजवा हात उशाला घेतलेला आहे पण या नंतरच्या महाबळीपूरम येथील प्रतिमेत तो सरळ डोक्याकडे पसरलेला आहे. परिवार देवतांत गरुड, युद्धोत्सुक मधुकैटभ व कांही इतर देवगण वगैरे दिसतात.
     येथपर्यंत प्रत्यक्ष प्रतिमांच्या आधारांवर दक्षिणेतील सहाव्या शतकांच्या शेवटपर्यंतच्या विष्णु-मूर्तीचा धावता आढावा घेतला. तो नीट समजून घेण्यास समकालीन वाङ्‌मयाची किल्ली हाताशी धरली पाहिजे. पण आपणांस त्या बाजूकडे वळणे शक्य होणार नाहीं. तरीपण बरेंच गाजलेल्या प्राचीनतम तामिळ वाङ्मय अर्थात् संगम साहित्याकडे विष्णुमूर्तीविषयी माहिती मिळविण्याकरितां ओझरता दृष्टिक्षेप करणें प्रासंगिक होईल.

संगम वाङ्मयांत विष्णू :

       इसवी सनांच्या सुमारे चौथ्या शतकांपूर्वी पांचशे वर्षाच्या कालखंडांत पसरलेले जुने तमिळ वाङ्मय म्हणजेच "संगम वाङ्मय' होय. यातील सिलप्पदिकारम्, परिपाडल आणि मणिमेकलई या ग्रंथांत सरासरी तिसऱ्या शतकांपर्यंतच्या वैष्णव देवतांचा विकास पाहता येतो.
       विष्णू किंवा तिरुमल हा श्यामल वर्णाचा असून तो पीतांबर व कौस्तुभ धारण करतो. त्याच्या डाव्या हातात शंख व उजव्यात चक्र असते. या शिवाय गदा, शार्ड धनुष्य व खड्ग ही त्यांची इतर आयुधें होत. तो गरुडध्वज तर आहेच पण या शिवाय तो हलध्वज, तालध्वज आणि गजध्वज ही आहे. याप्रसंगानें आपण मागें उल्लेखिलेल्या 'वृष्णिराजन्यगणा'च्या नाण्यांवरील सिंह-गज ध्वजाकडे लक्ष जाणें स्वाभाविक आहे, अर्थात् सिंहध्वज हा तेथे बलरामाचा तर गजध्वज हा कृष्णाचा हे उघड आहे.
         या वाङमयात विष्णुशिल्पांचे स्थानक, आसन व शयन असे तीन ठोकळ गट पाडून चर्तुव्यूह, पंचवीर, अष्टभुज, शेषशायी, वगैरे प्रकारच्या प्रतिमांचे उल्लेख आहेत. कृष्ण व बलरामाला इकडे ही महत्त्वाचे स्थान होते. बलरामांची स्वतंत्र मंदिरे ही असल्याचें दिसते. कृष्णांची मुख्य उपासना गोपाल या रूपांत केली जात असे व तो कुरणें आणि मैदानी मुलुखाचा अधिपती मानला जाई. नृत्यांशी ही त्याचा जवळचा संबंध होता.
      इतर अवतारांत वामन-त्रिविक्रमांचे स्थान बरेच वरचे आहे. वराह व नृसिंहाचे उल्लेख सीमित आहेत. परशुरामांचा कोंकण व केरळ याच्या उत्पत्तीशी संबंध आहे. रामकथेची संगम साहित्याला ओळख आहे पण विष्णूच्या अवतार रूपांत त्याचे उल्लेख मात्र थोडे आहेत. रामांची स्वतंत्र अशी मूर्ती चोळ राजांच्या उत्थान कालांपर्यंत मिळत नाही हें ही या संदर्भात लक्षांत ठेवावयास हवे.










विदर्भातील काही पुरातन कृष्ण मुर्ती :

विष्णु २

(सुमारे सातव्या शतकांपासून चौदाव्या शतकांपर्यंत)
   सहाव्या शतकांबरोबरच प्राचीन कालाची मर्यादा ओलांडून आपण मध्यकाळांत प्रवेश करतो. काहीं स्थानीय स्वरूपांची परिवर्तने वगळल्यास प्राचीन कालांत उत्तर भारतीय कलेत व काही अंशी दक्षिण भारतीय कलेंत ही बरीच एकरुपता दिसते, पण त्यानंतर मात्र तशी स्थिती रहात नाही. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे स्थानीय परंपरांचा जबरदस्त पगडा बसल्यामुळे सांस्कृतिक दृष्टीने सूत्रबद्ध असून देखील भौगोलिक दृष्ट्या पुढच्या भारतीय कलेंत अनेक रूपता निर्माण झालेली दिसते. मूर्तिशास्त्राच्या मदतीने ही गोष्ट जास्त स्पष्ट करतां येईल. विष्णू, शिव शक्ती, सूर्य, गणपती, वगैरे देव व त्यांच्याशी संबंधित कथादृष्यें एकाच प्रकारची असून देखील देशभिन्नत्वानें त्यातील वैविध्य नजरेत भरते. अर्थात् या विविधतेचा व त्या बरोबरच तेथील सर्वसामान्य गोष्टींचा अभ्यास केल्या शिवाय मध्यकालीन मूर्तिशास्त्राचे आकलन करता येणार नाही.
    विविधतेच्या दृष्टीने येथे ही उत्तरभारतीय परंपरा व दक्षिण भारतीय परंपरा असे दोन ठोकळ भेद करता येतील. उत्तर भारतीय परंपरेत तीन पोटभेद करावयास हवेत. ते म्हणजे पूर्व भारतीय परंपरा, मध्य व पश्चिम भारतीय परंपरा आणि दूर उत्तरेकडील परंपरा. दक्षिणी परंपरेचा विचार पुढे करू. या सर्वांच्या वैशिष्ट्यांचा बारकाईने अभ्यास व त्याबरोबरच त्या त्या भागांत निर्माण झालेल्या वाङ्मयांशी त्याची जमेल तितकी सांगड घालण्याचा प्रयत्न करावयास हवा. अशा प्रकारची सविस्तर चर्चा प्रस्तुत ग्रंथाच्या मयदित बसणार नाही, फक्त संक्षिप्त आढावाच घेता येईल, पण त्या पूर्वी उत्तरभारतांत मध्यकालीन मूर्तीच्या रचनेत जी एकरूपता मिळते तिची थोडक्यात चर्चा करू,
     मध्यकालीन मूर्तीची साधारण रचना (रे.चि. अकरा व बारा) या काळांतील अधिकांश प्रतिमा सपाट पाठीच्या (in bold relief) असल्यामुळे त्याचा पृष्ठभाग पाठशिळेने युक्त असतो. ही पाठशिळा मुख्यमूर्ती किंवा श्रीमूर्ती च्या डोक्यापेक्षा थोडी उंच असते. बऱ्याच प्रतिमांत श्रीमूर्तीला पाठशिळेंपासून थोडे सुटे दाखविण्यांचा प्रयत्न केला असतो व छाया आणि प्रकाशाच्या मदतीने तो पूर्ण सिद्ध होण्यांकरिता दोन उपायांची योजना केलेली असते. एक तर श्रीमूर्तीच्या छातीपासून पायांपर्यंतच्या भागाच्या दोन्हीं बाजूला पाठशिळेत त्याच आकाराची खाच तयार करतात व त्या पोकळीमुळे ती प्रतिमा पाठशिळेपासून अगदी सुटी दिसू लागते. कधी कधी अशाच प्रकारची भोके मस्तकांभोवती प्रभामंडळांत ही करतात. दुसरा उपाय म्हणजे जरी मूर्ती पाठशिळेला चिकटलेल्या असल्या तरी जागा मिळाल्यास त्यांच्या आजुबाजूस दर्शनी भागांइतकेच कोरीव कातीव काम लक्षपूर्वक करतात.
     आतां प्रतिमेच्या साधारण घटकांचा विचार करू. खालपासून सुरुवात केल्यास प्रथम घटक म्हणजे पीठ किंवा वाहिका. वाहिकेचा दगड साधा चौकोनी तरी असतो किंवा त्याचे टोकदार अंश पुढे निघालेले असतात. यांना रथ व उभ्या टोकांना पूरित असे म्हणतात. रथांच्या संख्येप्रमाणें वाहिकेला 'त्रिरथ', 'पञ्चरथ' किंवा 'सप्तरथ' अशा संज्ञा देतात.
   वाहिकेच्या दर्शनी भागांवर मधोमध कमळाचा दांडा आणि आजुबाजूंस 'पद्मलता' पसरलेली दाखविण्यांचा प्रघात आहे. याला अर्थात् अपवाद आहेतच. पद्मलतेच्या वेटोळ्यांत श्रीमूर्तीचे वाहन, एकटा किंवा सपत्नीक मूर्तिस्थापक, हातांत घागरी घेतलेले समुद्र, नाग व त्यांच्या मधें पृथ्वी, इतर बारक्या आकृती किंवा पूजेची उपकरणी वगैरे वस्तूही दाखवितात. येथेच कधी कधी लेख ही लिहिलेले असतात.
   वाहिकेवर कधी कधी लहान किंवा मोठे दुहेरी कमळ पसरलेले असते व त्यामुळेच अशा प्रकारच्या पीठाला 'महांबुजपीठ' असेही म्हणतात. या महाम्बुजांवरच श्रीमूर्तीच पाय टेकलेले असतात. या ओट्यापासूनच पाठशिळेचा प्रारंभ होतो. कधी कधी पाठशिळा संपूर्ण प्रभामंडळांचे ही कार्य साधीत असते व म्हणूनच तिला आपण 'प्रभावळ' या शब्दांने ओळखतो, पण बहुतेक श्रीमूर्तीच्या मस्तकाच्या मागें प्रभामंडल स्वतंत्रपणें दाखविलेले असते.

   मुख्य प्रतिमेच्या पायाचे बाजूस काही परिवार देवतांची स्थानें असतात. येथूनच मागच्या बाजूस द्वारशाखाही दिसू लागतात. द्वारशाखांच्या बाहेरच्या कडेला 'गजसिंह' किंवा 'गजशार्दूल' हैं अलंकरण दिसतें. हत्ती व त्यांचे मस्तकांवर मागील पाय टेकून पुढचे पंजे उचलून झेप घेणारा सिंह म्हणजेच 'गजशार्दूल' अलंकरण. यालाच शिल्पशास्त्रांत 'व्याल' म्हणून ओळखतात. व्यालांचे अनेक प्रकार आहेत पण तिकडे तूर्त शिरण्यांचे आपणांस कारण नाही.
    गजशार्दूलावर मगराचे तोंड किंवा 'मकरी' दिसते. दोन्हीं बाजूला दिसणारी ही मगराची तोंडे म्हणजेच द्वारशाखावर आडवी ठेवलेली मकरमुखी तुळई! येथपर्यंत श्रीमूर्तीचे खांदे आलेले असतात. या पुढील अलंकरणें देशकालपरत्वें थोडीफार भिन्न असतात. पालकलेंत बहुतेक एक एक मोर किंवा 'मयूरक' दिसतो. कुठें कुठें किन्नर ही आढळतात. याचे जवळ पास बऱ्याच ब्राह्मणधर्मीय मूर्तीत तीन पैकी दोन कोनाडे किंवा 'रथिका' दिसतात. मधली रथिका असतेच असें नाही, पण असलीच तर थोडीफार आणि पाठशिळेच्या मधोमध असते. रथिकेत असलेल्या मूर्तीस 'रथिका बिंब' असे म्हणतात. विष्णूमूर्तीत रथिका बिंब म्हणून ब्रह्मा, विष्णू व शिव आढळतात.
   रथिकांच्या जवळच श्रीमूर्तीच्या मस्तकाभोवती असणारे प्रभामंडळ व त्याचे दोन्हीकडे माळा घेऊन ओळंबणारे देवगण दिसतात. हे गंधर्व किंवा विद्याधर एकटे किंवा सपत्नीक असतात. कधी कधीं हे ढगात उडत आहेत असेंही दाखवितात.
     सर्वांचे शेवटी येते पाठशिळेचे वरचे टोक किंवा 'शृंग'. यावर रुचिभेदांप्रमाणे निरनिराळी अलंकरणें दिसतात. कीर्तिमुख, छत्र, कमळ, आंब्याची पानें व फळें (आम्रलुंबी), ग्रास किंवा देवदुंदुभी, बोधिवृक्ष, मुगुट, वगैरे अनेक प्रकार देश, रुची, काल व प्रयोजन याच्या भिन्नत्वानें दिसतात.

विशिष्ट रचनेची वैचारिक बैठक :

    वर वर्णिलेली अलंकरणें व त्यांचा क्रम न्यूनाधिकरूपाने उत्तर भारतांत सर्वत्रच आढळतो. आता प्रश्न असा की हा बहुमान्य क्रम फक्त एक रीत किंवा कित्ता म्हणूनच पाळला जात असे की त्यांच्या मुळांशी काही तर्कशुद्ध बैठक ही होती? प्रो. स्टेला क्रॅमरीश यांनी या बाबतीत असे मत मांडले आहे कीं ज्या आसनांवर श्रीमूर्ती बसली किंवा उभी आहे त्याचा पाठ टेकण्यांकरिता तयार केलेला भाग म्हणजेच पाठशिळा ! ही पाठशिळा आसन किंवा सिंहासनांचेच एक अंग असल्यामुळे तिच्या अलंकरणाकडेही लक्ष पुरवीत व तिला गजसिंहादि अनेक आकृत्यांनी अभिमंडित करीत'. क्रॅमरीश बाईंच्या मताला पुष्ट करणारे एक असे ही विधान केले जाते की पाठशिळेवर दिसणारे मकर तोरण व द्वारशाखा मूळ आसनांच्या पाठटेकणीचे उरलेले अवशेष आहेत. अशी आसनें व त्यावर बसलेल्या बारडोक्शो, लक्ष्मी सारख्या देवी कुषाण व गुप्त राजांच्या काही नाण्यांवर पाहता येतात. या विधानाला सर्व सामान्य रूपाने सत्य म्हणून स्वीकारता येणार नाहीं, कारण जेव्हां कलाकाराला आसनांची पाठटेकणी दाखविणें इष्ट असे त्यावेळी तो तसें स्वतंत्रपणे करून त्याबरोबरच तोरण व द्वारशाखा ही दाखवीत असे (पहा ल.सं.जी ३००; ६६.४३)
     पाठशिळेवर दिसणाऱ्या 'द्वारशाखा', 'व्याल', मरकमुख तोरण किंवा 'ललाटिका' (वैदिक रराटिका), 'रथिकाबिंब' कीर्तिमुख वगैरे अलंकरणांचा विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते कीं पाठशिळेत पेरली गेलेली ही अलंकरणें मुळांत गृह किंवा मंदिर-शिल्पांत वापरली जात असत. यांचा संबंध सरळ मुख्य द्वाराशी आहे. मग ते गर्भगृहाचे दार असो किंवा महालाचे सिंहद्वार असो. त्यामुळे पाठशिळेवरही दाराचाच आभास उत्पन्न केला जाई असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. ही विचारसरणी गृहीत धरल्यास हे सांगणें वावगे होणार नाही कीं येथे देवगृहाच्या आंत संस्थापित श्रीमूर्ती उपासकांवर प्रसन्न होऊन त्याला भेटण्यांकरिता गर्भगृहाच्या दारापुढें किंवा सिंहद्वारापुढें येऊन उभी राहिली आहे.
    या व्यतिरिक्त प्रतिमेवर दिसणाऱ्या निरनिराळ्‌या अलंकरणांचा एक दुसरा ही उदात्त असा अर्थ काढता येईल. वाहिकेशी संबंधित अलंकरणे म्हणजे कमललता, कूर्म, नाग, घागरी घेतलेले समुद्र हे होत. पाण्यांचे प्रतिनिधत्व करणाऱ्या या गोष्टी पर्यायाने पाताळाचेही प्रातिनिध्य करू शकतात. अर्थात् वाहिकेचा खालचा भाग म्हणजे पाताळलोक व वरचा थर म्हणजे पृथ्वी अशी संगती लावता येईल. पृथ्वी म्हणजे झाली गर्भगृहाची भूमी. येथूनच द्वारशाखा व त्याचा बाह्यपक्षाची सुरुवात होत असते याच भूमीवर परिवार देवता उभ्या असतात व त्यांच्या पाठीकडे किंवा वर पृथ्वीची प्रतीके म्हणून गज-सिंह दिसतात. कधी कधी या दोघांच्या मधल्या भागांत म्हणजे 'व्यालांत रालांत' माणसे योद्धे ही दिसतात. येथपर्यंत भूलोकाचे अंकन झाले. ललाटिकेवर दिसणारे मोर व किन्नर पृथ्वीच्या आकाशांचे प्रातिनिध्य करतात. यावर रथिकेचा भाग ब्रह्मदेव, विष्णू व महादेव यांची मंदिरें भूलोकांच्या बऱ्याच वर असावी हे औचित्यांस धरूनच आहे. या भागाला स्वर्गादि लोक असे नांव देतां येईल. सर्वात वरचे टोक म्हणजे शृंग. पालकलेंत येथें पुष्कळदा ग्रास किंवा कीर्तिमुख दिसते. या प्रमाणें खालच्या टोकाला सृष्टीचे उत्पादक 'महांबुज' आणि त्याचा पसारा, तर वरच्या टोकाला महाविनाशाचे प्रतीक 'ग्रास'! या दोन्हींमध्ये मूर्तिकार निरनिराळ्या प्रतीकाच्या मदतीने अशा विश्वाची कल्पना करीत असतो ज्यांत श्रीमूर्ती समावलेली आहे.

विष्णुमूर्तीचे प्रथम वर्गीकरण:-

द्वादश विभव :
    मूर्तीच्या घडणी प्रमाणे स्थिर केलेले स्थानक, आसन व शयन अशा प्रकारच्या वैखानसागमाने केलेल्या वर्गीकरणांचा आपण मागे विचार केलेला आहे. मध्यकालीन प्रतिमांचे देखील तशा प्रकारचे वर्गीकरण संभवते.
   या शिवाय विष्णुमूर्तीच्या आयुध रचनेला मुख्य आधार धरून मध्यकालीन आचार्यांनी त्यांची काही वर्गीकरणे मांडली आहेत. यांचा मुख्य आधार म्हणजे विष्णूंचे चार व्यूह-वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरूद्ध हे होत. अग्निपुराण' व अहिर्बुध्न्य संहितेत' चार व्यूहांची प्रत्येकी तीन अशी एकूण बारा व्यूहान्तरांची किंवा विभवांची खालील प्रकारे मांडणी केली आहे.
                                               आदिमूर्ती (विष्णू)
                                                        व्यूह
वासुदेव                          संकर्षण               प्रद्युम्न                   अनिरुद्ध
१. केशव                        ४. गोविंद         ७. त्रिविक्रम             १०. हृषीकेश
२. नारायण                     ५. विष्णु          ८. वामन                ११. पद्मनाभ
९. श्रीधर                        ३. माधव         ६. मधुसूदन              १२. दामोदर
बारा व्यूहांतर किंवा विभव
     या बारा विभवांची लक्षणें वृद्धहारीतस्मृती, परमेश्वरसंहिता, अहिर्बुध्न्यसंहिता, वगैरे ग्रंथांत दिली आहेत. यात लक्षात घेण्यांसारखी गोष्ट म्हणजे ही कीं अहिर्बुध्न्यसंहितेनें व परमेश्वरसंहितेने शंखचक्रगदापद्म या सर्वसामान्य आयुधांच्या आधारावर वर्गीकरण दिले आहे, पण वृद्धहारीतस्मृतीनें मात्र त्याशिवाय असि (तलवार), हल (नांगर), मुसळ, शार्द्धनुष्य आणि वज्र अशी पांच नवी आयुर्धे घातली आहेत.
    बारा रूपांच्या वर्गीकरणांची वर्षाच्या बारा महिन्यांशी संगती वराहमिहिराच्या वेळेपासूनच लावीत होते. नारदीय संहितेने ही गोष्ट जास्त स्पष्ट करून बारा रूपांची आयुध लक्षणें ही दिली आहेत. ही बारा रूपें म्हणजे जरी विष्णूची बारा व्यूहान्तरेंच असली तरी इतर पांचरात्र संहितांशी ह्यांचे लक्षण साम्य असावे असें आज तरी वाटत नाही; पण यांचा निश्चित निर्णय आयुधक्रमांची परिभाषा सांगणाऱ्या 'पूर्वपश्चिमयोगेन तथा वै दक्षिणादितः' ह्या श्लोकार्थांवर अवलंबून आहे'.
     दुसरें म्हणजे असें की नारदीयसंहितेने बारा महिन्यांच्या विष्णुरूपांचें वर्णन करतांना केशवापासून आरंभ न करतां तो विष्णुपासून केला आहे व त्याची समाप्ती गोविंदावर झाली आहे.
    मूर्तिक्षेत्रांत विष्णूंच्या विभवांचे अंकन कमी दिसते. असे अंकन असलेला सुमारे दहाव्या शतकांतील एक शिलापट्ट झांशीच्या राणीमहाल संग्रहांत ठेवला आहे (सं.सं. ८०). येथे द्वादश विष्णूं बरोबर पंचविनायक, सप्तमातृका, वगैरे ही दाखविल्या आहेत.

विष्णु मुर्तीचा आयुधक्रम ( घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने )

   विष्णूच्या चार हातात दक्षिण अधः कर क्रमाने (दक्षिण-अधःकर क्रम - जेव्हा दोनापेक्षा जास्त हात असलेली देवमूर्ती असते तेव्हा या मूर्तीच्या हातातील लांच्छने किंवा धारण केलेल्या वस्तू पुढील पद्धतीने विशद केल्या जातात. सुरुवात सर्वात खालच्या उजव्या हाताने होते. सर्वात वरच्या उजच्या हातातील लांच्छन नमूद केल्यानंतर अर्धविराम दिला जातो. मग सर्वात वरच्या डाव्या हातातील लांच्छनापासून सुरुवात करुन सर्वात खालच्या डाव्या हातातील लांच्छनापर्यतची लांच्छने नमूद केली जातात. लांच्छने नसल्यास वरद वगैरे प्रकारची हस्तमुद्रा नमूद केली जाते. थोडक्यात, सर्वात खालचा उजवा हात ते सर्वात खालचा डावा हात असा हा अनुक्रम असतो. जागा वाचवण्यासाठी यापुढील विवेचनात या पद्धतीने लांच्छन वर्णन करताता "द.अ.क्रमाने" असा थोडक्यात निर्देश करण्यात येईल) शंख, चक्र, गदा आणि पद्म ही लांच्छने आहेत.

शं = शंख, च = चक्र, ग = गदा, प = पद्म; अ असि (तलवार)
ह = हल (नांगर), मु = मुसळ, व = वज्र
* आयुर्धे एकच असली तरी वर्णात फरक आहे. नारायण श्याम असून त्रिविक्रम लाल आहे.
+ नारायण आणि वामन यांचा आयुधक्रम एकच आहे. या दृष्टीने अहिर्बुध्न्य संहितेचा पाठ जास्त शुद्ध वाटतो. 




 

 

 द्वितीय वर्गीकरण, चतुर्विंशतिमूर्ती :

      बारा विभवांची सुधारलेली आवृत्ती म्हणजें विष्णूच्या चोवीस रूपांची कल्पना होय. याच्या दोन पद्धती अस्तित्वांत होत्या. प्रथम म्हणजे चार व्यूह बारा विभव आणि इतर रूपांची कल्पना करून चोवीस ही संख्या तयार करणें. अग्निपुराण'", पद्मपुराण", स्कंदपुराण, वृद्धहारीतस्मृति", अभिलाषितार्थ चिंतामणि, रूपमंडन, चतुर्वगर्चितामणि, धर्मसिंधु, वगैरे ग्रंथास हीच परंपरा मान्य आहे. दुसरी पद्धत म्हणजे अशी की फक्त बारा विभव, आठ वरील पद्धतीची रूपें अशा विसाच्या संख्येत चार नव्या रूपांची कल्पना करून चोवीस ही संख्या पुरी करणें. येथें मूळ व्यूहांना वगळल्यामुळे कृष्ण- कार्तिकेय, तार्ध्यध्वज, जयंत व गोवर्धन अशी चार नवी रूपें घालावी लागली. या परंपरेचे उल्लेख अपराजितपृच्छा" (सुमारें ११७५-१२५० इ.स.) व रूपमंडन' (सुमारें सनांचे सोळावे शतक) या ग्रंथात सापडतात. हे फार जुनेंही नाहीत व तितकेसे प्रसिद्धही नाहीत. विषय समजण्यांस खालील तक्ता उपयोगी पडेल.

विष्णू

वासुदेव

संकर्षण

प्रद्युम्न

अनिरुद्ध 

व्यूह

केशव, नारायण

गोविंद, विष्णू

त्रिविक्रम, वामन

हृषीकेश, पद्मनाभ

विभव

माधव 

मधुसूदन

श्रीधर

दामोदर

 

अधोक्षज, पुरुषोत्तम

अच्युत, उपेंद्र

नारसिंह, जनार्दन

हरि, कृष्ण

नवी आठ रूपें

कृष्णकार्तिकेय

तार्क्ष्यध्वज

जयंत 

गोवर्धन

नवी चार रूपें

 
                                                                    विष्णू
वासुदेव                       संकर्षण                    प्रद्युम्न                 अनिरुद्ध                      व्यूह
 
केशव, नारायण,       गोविंद, विष्णू,      त्रिविक्रम, वामन,      हृषीकेश, पद्मनाभ,              विभव
माधव                     मधुसूदन              श्रीधर                      दामोदर
अधोक्षज, पुरुषोत्तम  अच्युत, उपेंद्र      नारसिंह, जनार्दन   हरि, कृष्ण,            नवी आठ रूपें
कृष्णकार्तिकेय         तार्थ्यध्वज         जयंत                      गोवर्धन                 नवी चार रूपें                                       
     चोवीस मूर्तीची वाढ कशी झाली हे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षणांकडे वळू. वरील सर्व मूर्ती स्थानक स्वरूपाच्या असून ग्रंथांप्रमाणे आयुधक्रमांच्या भिन्नतेशिवाय त्यांच्या लक्षणांत इतर कोणताही भेद नाही. ही आयुधं म्हणजे शंख, चक्र, गदा व पद्म ही होत. इतर आयुधांचा येथे विचार नाही. या आयुधांपैकी शंख, गदा व चक्र ही जुनी आहेत पण पद्म मात्र गुप्तकालाच्या शेवटपर्यंत आपणांस दिसलेले नाही. अर्थात् ह्या सर्व प्रकारचे वर्गीकरण गुप्तोत्तर कालांतील किंवा त्यानंतरचे म्हणजे इसवी सनाच्या सहाव्या शतकांनंतरचे असावयास पाहिजे. हे वर्गीकरण असलेले बरेचसे ग्रंथ जसें अभिलषितार्थचिंतामणि (सुमारे ११३० इ.), चतुर्वगचिंतामणि (सुमारें तेरावे शतक), अपराजितपृच्छा (सुमारे ११७५-१२५०), रूपमंडन (सुमारें १६ वें शतक), धर्मसिंधु (सुमारें १७९१ ३) उघडच मध्यकाळांतील आणि बरेच अलीकडचे ग्रंथ आहेत.
     गोपीनाथ राव, डॉ. बॅनर्जी वगैरे विद्वानांच्या मते वरील ग्रंथांत दिलेल्या लक्षणांत बऱ्याच ठिकाणी एकरूपता आढळत नाही, त्यामुळे एका ठिकाणचा श्रीधर दुसऱ्या ठिकाणी वेगळाच कोणीतरी झालेला दिसतो. यांच्या मतें रूपमंडनांची परंपरा सर्वात शुद्ध असून पद्मपुराणाची सदोष आणि त्रुटित आहे." मुळांत प्रश्न असा की आयुधाची मोजणी कशी व कुठून करावयाची? साधारणपणे हा क्रम घड्याळाच्या आकड्यांप्रमाणें चालणारा म्हणजें 'प्रदक्षिणा क्रम' असावा हे पुष्कळांस मान्य आहे." पण तो नेमका कुठून सुरू करावा यांत मात्र मतभिन्नता आहे." ही मतभिन्नता पूर्णपणें लक्षांत घेऊन आयुधक्रमांची लक्षणें स्पष्ट केल्यास (पुढे दिलेल्या कोष्टकांत तसे करण्यांचा प्रयत्न केला आहे.) असें दिसून येईल की -
१) (केशव, माधव, गोविंद, विष्णू, संकर्षण, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, व अच्युत) दहा रूपांत मतभिन्नता नाही.
२) (नारायण (७), मधुसूदन (१), श्रीधर (२), हृषीकेश (२), दामोदर (७), व कृष्ण (७)) सहा रूपांत फक्त एक मतानें भिन्नत्व आहे.
३) (वामन (३,९), पद्मनाभ (२,५), जनार्दन (४,६), प्रद्युम्न (१,२), उपेन्द्र (२,७), हरि (१,२)). सहा रूपांत दोन मतानें भिन्नत्व आहे.
४) अग्निपुराणाने प्रदक्षिणाक्रम कुठून सुरू होतो हे. दिलेले नाही.
५) पद्मपुराण व चतुर्वगर्चितामणीची यादी अपूर्ण आहे.
६) हस्तलिखितांच्या पाठभेद व हस्तदोषांमुळे देखील पाठभेद संभवतात.
पगशंच - अधोक्षज मुर्ती








 

 



 



हि कृष्ण मूर्ती पहूर ता.बाभुळगाव जि.यवतमाळ येथील आहे.बघा तत्कालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना.
मुख्य मूर्तीच्या चारही बाजूने लहान मूर्ती कोरल्या आहेत.
विष्णू मूर्ती आहे शंख चक्र आहे आणि ४ हात आहे

 







ग शं च प - वासुदेव मुर्ती

प च शं ग  जनार्द्न मुर्ती
ग प च शं  अच्युत मुर्ती







ग प शं च  विष्णु मुर्ती

















प ग शं च अधोक्षज मुर्ती
ग शं च प वासुदेव मुर्ती














प शं च ग केशव मुर्ती


 







 

 भारतीय मूर्तिशास्त्र पूर्वभारतीय कलेत विष्णू

प्रस्तावना :
   येथे पूर्व भारत हे पद व्यापक अर्थात वापरलेले असून त्यामध्यें अखंड भारताचे बंगाल, बिहार व उत्तरप्रदेशाच्या पूर्वी भागाचा समावेश होतो. कुषाण काळांतील मथुरा व गुप्तकाळातील सारनाथ (वाराणसी) येथील शिल्प परंपरेची छाप पूर्वभारतीय शिल्पांवर पडली आहे. सुमारे आठव्या शतकांपर्यंतच्या इकडील कलाकृतींची संख्या फारच थोडी आहे. ठळक नांवे द्यावयाची म्हटली तर यात चंडीमऊ येथील शैव फलक, मणियारमठ राजगीर येथील स्टको शिल्ये, डाहपर्बतिया (तेजपूर) येथील गंगायमुना व पहाडपूर, येथील शिल्पांची प्रामुख्यानें गणना करावी लागेल.

    इ.स. ७५० मधें बंगालच्या गादीवर पाल राजा गोपाल हा आला व यांच्या कारकीर्दीत पूर्वभारतीय कलेचे स्वतंत्र असे रूप बाळसें धरु लागले. सुरुवातीला पालांच्या बरोबरच सेन वंशाची ही राजवट चालू होती. सेनांचा मूळ पुरुष दक्षिणेच्या चोळ सेनेचा एक कानडी अधिकारी होता. काही काळानंतर इकडील संपूर्ण राज्य सूत्रे सेनांच्याच हातांत आली. याप्रमाणे पूर्व भारतीय कलेचा काल सुमारे सन् ७५०-११९९ (सरासरी साडे चारशे वर्षे) हा धरला जातो. बंगाल व बिहार ही राज्यें जरी या कलेची माहेरघरे असली तरी तिच्या कृती मात्र काश्मीर व लंकेपर्यंत पसरल्या होत्या व तिनें, नेपाळ, तिबेट, ब्रह्मदेश व जावा यांना कायमचे ऋणी करून ठेवले. इस्लाम आक्रमणाच्या तडाख्यांत सांपडल्यानंतर बंगाल व बिहार मधे या कलेची इतिश्री झाली पण नेपाळ व तिबेट मधें मात्र तिच्या परंपरा चिरकाल जीवित होत्या.
    पाल राजे जरी बौद्ध होते तरी बहुसंख्यक प्रजा ब्राह्मण धर्मानेच वागणारी होती. पालांच्या काळांत राजाश्रयामुळे बौद्ध प्रतिमा बऱ्याच घडविल्या गेल्या सेन राजवट ब्राह्मण धर्माला चिकटून राहिली. या वंशाचे कांही राजे सूर्य व शिवाचे उपासक होते तर लक्ष्मणसेन हा विष्णुभक्त होता. यामुळे पूर्वभारतीय कलेच्या शेवटल्या चरणांत अर्थात् अकराव्या व बाराव्या शतकांत विष्णुमूर्तीची संख्या चांगलीच वाढलेली दिसते. मात्र त्यामानानें शैव व जैनमूर्ती थोड्या मिळतात.
    पूर्व भारतीय कलेचे मुख्य माध्यम म्हणजे संथाल परगण्याच्या राजमहाल येथील खडकांतून मिळणारा 'कश्तीपाधर' नांवाचा निळसर दगड हे होय. याचे दोन प्रकार आहेत. पहिला ओबडधोबड व दुसरा जास्त गुळगुळीत. या शिवाय या कलेत काष्ठ, माती, स्टको आणि अष्टधातू ही माध्यमें वापरली गेली आहेत.
पूर्व भारतीय कलेची इतपत तोंड ओळख करून घेतल्यानंतर आतां पुन्हा कथासूत्र हातात घेऊ.

विष्णुमूर्तीची वैशिष्ट्ये :

    ख्रिस्ताच्या अकराव्या-बाराव्या शतकांत बंगालमधे विष्णुभक्तीची फार मोठी लाट आली. त्यामुळे जरी आठव्या शतकांपासून या भागांत विष्णूंच्या तुरळक प्रतिमा मिळू लागतात. तरी यांच्या भरभराटीचा काळ म्हणजे हीच दोन शतके होत. या प्रतिमांची वाङ्मयीन शब्दचित्रे पद्मपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, वगैरे ग्रंथांत पहायास मिळतात. या प्रतिमांची काही परिभाषिक शब्दावली रेखाचित्र, फलक बारामध्ये स्पष्ट करण्यांचा प्रयत्न केलेला आहे. एवढ्यासाठी त्यांची पुनः चर्चा न करता विष्णुप्रतिमांच्या प्रमुख वैशिष्ट्यांकडे वळतो.
१) बहुतेक विष्णुप्रतिमा स्थानक समभंग स्वरूपाच्या आहेत. आसनमूती कचित दिसतात पण शयनमूर्ती जवळजवळ नाहीत.
२) बऱ्याच प्रतिमा परिवार देवतांसह आहेत. श्रीमूर्ती ही सर्वांत उंच असून त्या खालोखाल उंची लक्ष्मी व सरस्वती असते. त्याहीपेक्षा आयुधपुरुष ठेंगणे असतात. गरुड, मालाधारी गंधर्व दशावतार वगैरे किरकोळ स्वरूपाचे असतात.
३) पाल-विष्णू प्रतिमेंत रथिकार्बिबें ब्रह्मदेव व शंकर असत नाहीत.
४) विष्णूच्या पायाखालील महांबुजपीठ, वर उडणारे विद्याधर, द्वारशाखा व त्यांची अलंकरणें ही बऱ्याच ठिकाणी मिळतात.
५) विष्णूच्या पायांच्या आजुबाजूला एक लांब दांड्याचे कमळ उगवतांना दाखवितात. हे दांडे सामान्य हातांपर्यंत पोचतात व त्याचे टोकावर एक एक कमळ उमललें दिसते. हे क्रमानें शंख व वरदमुद्रेत असलेल्या हाताच्या पाठीकडे चिकटलेले असतें.
६) सुरुवातीचे काही अपवाद वगळले तर या कलेतील बव्हंशी प्रतिमा 'उद्द्घाहू' आहेत. उत्तर गुप्तकाळांबरोबर 'प्रलंबबाहू' हा प्रकार जवळजवळ मावळला.
७) प्रभामंडल हे गोल किंवा लंबगोल आकाराचे असतें. पण गुप्तकालाच्या मानानें त्यातील अलंकरणें बेताचीच असतात.
८) विष्णूची मुखाकृती सौम्य व लोभस असते पण नाक, डोळे, हनुवटी, भिवया, वगैरे अवयवांत एक प्रकारची तीक्ष्णता असते. परिवार देवतांसही ही गोष्ट लागू पडते.
९) हातांची बोटे नाजूक व नखरेल असून आयुधांच्या पकडीत दृढता दिसत नाही.
१०) वस्त्रे - सामान्यपणें नेसूचे व पांघरावयाचे अशी दोन फारच तलम प्रकारची (सुसूक्ष्म) वस्त्रं असून त्यावर कधी कधी वेलबुट्ट्यांचे सुंदर काम दिसते.
११) दागिनें - दांगिनें मात्र भरघोस असून ते घडवितांना जणुं कीं काय मूर्तिकाराने आपले कौशल्य पणाला लावलेले असतें. सामान्य दागिन्यांशिवाय हातांपायांच्या सगळ्या बोटांत घातलेल्या अंगठ्या (अंगलीयक आणि पादमुद्रिका) मनगट व कोपर यामध्यें माळेसारखा घातलेला सैलसर दागिना, व पायांतील नूपुरें हे विशेष दागिनें होत. मुगुट बसका किंवा उंच प्रकारचा (करण्डक) असतो. श्रीवत्स व कौस्तुभाची स्थिती स्पष्ट नाही. विशेष लक्ष वेधण्यांसारखें म्हणणें विष्णूचे 'सोन्याचे जानवे' (सुवर्णसूत्र, हेमयज्ञोपवीत) व त्याची मधली रत्नखचित गाठ (मध्य ग्रंथिमणि) ही गाठ मोठी रुबाबदार दिसते.
१२) आयुधे - गदा लांब व आखूड दोन प्रकारची असून कधी कधी तिच्या कुंभाला एक मोठासा फुलोरा लावलेला दिसतो. (रे.चि. सात ३). शंखाच्या पकडीची निरनिराळी लोंबणारी दोरी मात्र बऱ्याचं ठिकाणीं नव्यानें दिसतें (रे.चि. सात ७). सामान्य उजवा हात वरदमुद्रेत असतो व त्यावर बारकेसे कमळ कोरलेले असते; पण कमळाचा प्रामुख्याने प्रयोग दिसत नाही. सामान्यपणे वर, गदा, चक्र व शंख असा आयुधक्रम आहे.
    याशिवाय अपवाद म्हणून अक्षमाला (चित्र १९) गरुडध्वज", फळ, लक्ष्मी, सरस्वती युक्त दोन कमळे", और आयुधं क्वचित आढळतात.
१) आयुधपुरुष - आतापर्यंत मानांचे स्थान मिळत असलेले आयुधपुरुष तर ते हवेतच असा अनिवार्य दंडक आता राहिलेला नाही, दुसरे। दिसतात. एक तर हळुहळू गदादेवीचे दर्शन क होत असून पालकलेत तरी चक्र व शंख हेच दोन पुरुष मुख्यत्वे दिसतात. तिसरे म्हणजे चक्राखाली चक्र व शंखाखाली शंखपुरुष असावा असा जुना क्रमही पाठलेला दिसत नाही. उलट फक्त परंपरेचा निर्वाह डोक्यावर किंवा हातात मूळ आयुध असलेल्या त्यांच्या किरकोळ प्रतिमांना बाह्य द्वारशाखेवर स्थान मिळाल असते.
या सामान्य पद्धतीला काही प्रतिमा मात्र अपवाद आहेत (उदा. पटना सं. ७३; लक्ष्मणकटी येथील प्रतिमा.)

पूर्व भारतीय कलेतील काही विशिष्ट प्रतिमा :

चालू विषय संपवितांना पाल-कलेच्या कांही महत्त्वाच्या व अपवादात्मक अशा विष्णुप्रतिमांचा ओझरता उद्देस करणें आवश्यक आहे.
१) प्रलंबबाहू विष्णू, गुप्तकालीन परंपरा (IMC., सं. ३८७३)
२) फळ व शंख घेतलेला विष्णू (ल.सं.सं. २६.६३७ धातुप्रतिमा, चित्र १८)
३) दक्षिण भारतीय कलेची छाप असलेला विष्णू (IMC., सं. ६३१३)
४) माळा घेतलेला व शंख कुंडलें असलेला प्रलंबबाहू विष्णू (पटना सं.सं. ६३) चित्र १९.
५) चक्र, शंख, गदा व कमळाचे देंठ घेतलेला विष्णू".
६) चक्र, दोन कमळे व गदा घेतलेला विष्णू, कमळांवर गजलक्ष्मी व सरस्वतीच्या बारक्या मूर्ती आहेत.

अवतार :

    आतां अवतार प्रतिमांकडे वळू. यांचे पाठशिळेवरील दशावतार मालिका व स्वतंत्र प्रतिमा असे दोन प्रकार मिळतात याबद्दल दखल घेण्यांजोग्या खालील प्रतिमा आहेत :
    १) नैसर्गिक मत्स्याला मानवीय हात दाखवून अंकित केलेला मत्स्यावतार (ल.सं.एच् १०७, चित्र २०), हिंड मत्स्योद्भुत चतुर्भुज विष्णू बाजूला लक्ष्मी सरस्वती दिसतात
 २) आठवा अवतार म्हणून कृष्णांच्या ऐवजी बलरामांचे अंकन (उदा. ल.सं.एच्. १०६).
३) नववा अवतार म्हणून चीवर संघाटी असलेला बुद्ध दाखवतात. हा उभा किंवा बसलेला असतो. बाच्न भूमिस्पर्शादि मुद्राही आढळतात.
४) नृवहाराच्या बऱ्याच मूर्ती आहेत. एकीच्या वाहिकेवर गरुडाबरोबर गणपतीही दिसतो."
५) वामनाचे बटू, चतुर्भुज विष्णू व त्रिविक्रम या तीन रूपांत अंकन आढळते. बटुरूपाच्या स्वतंत्र प्रतिमा नाहीत पण त्रिविक्रम मूर्तीत तो दिसतो. वामन-विष्णू हा बुटका व पुष्ट शरीराचा दाखवतात व त्याच्या डोक्यावर • मुगुट असतो (चित्र २१) गरुडपुराणांप्रमाणे" कश्यपाला 'हस्व', 'पृथुलमूर्धा', 'बृहत्तनु, पण 'लघुपार  व 'चतुर्भुज' असा वामन दिसला होता. अग्निपुराणांलाही हा मान्य आहे. त्रिविक्रम हे वामनांचे तिसरे रूप. येथे झालेले नवे फरक म्हणजे एक तर छातीजवळ घेतलेल्या उजव्या हातांची मुद्रा व दुसरें म्हणजे उचललेल्या पायांच्या टोकांजवळ गुप्तकाळांतील ब्रह्मकपालाचा लोप व त्याजागी चिमुकल्या ब्रह्मदेवाचे दर्शन हे होत.
६) नरसिंहांच्या मूर्तीचे पालकलेत एकाधिक प्रकार मिळतात. चतुर्भुज व षड्भुज" नरसिंह तर मिळतातच पण सर्वांत महत्त्वाचा व अप्रसिद्ध प्रकार म्हणजे गजांकुशधारी लक्ष्मी-नरसिंह हा होय. वाराणसीला एका मंदिरांत (मोहल्ला राजमंदिर) असलेल्या सुमारें ५ ।। फूट उंचीच्या या चतुर्भुज प्रतिमेच्या वरच्या उजव्या हातांत अंकुश व डाव्या हातांत हत्ती आहे (चित्र २२). मांडीवर टेकलेले खालचे हात वरद मुद्रेत आहेत. देव पद्मासनांत बसला असून त्याच्या मांडीवर अर्धवट लोळलेली लक्ष्मी आहे. तिच्या हातात कमळ आहे व उजवा बहुतेक नरसिंहाच्या पाठीकडे गेलेला आहे. नरसिंहाचे पाय बऱ्याच अंशी सिंहांच्या पंज्याप्रमाणें आहेत. अशाच प्रकारची एक दुसरी लहान पण निम्नकोटीची प्रतिमा वाराणसीच्या एका अन्य मंदिरांत सुमारें पंधरा वर्षांपूर्वी होती. आता बेपत्ता आहे. नरसिंहाचे हे ध्यान मला तरी कोणत्याही आर्ष ग्रंथांत मिळाले नाही.
७) राम पालकलेंत रामाच्या स्वतंत्र प्रतिमा जवळजवळ नाहीत. अपवाद म्हणून कदाचित एकीकडे बोट दाखविता येईल. (IMC., अ. २५१८९)
८) बलराम - बलरामाच्या स्वतंत्र मूर्ती मिळतात (ब्रोंझ प्रतिमेंकरिता पहा चित्र ३०) तसेच एकानंशा व कृष्ण यासह पालराजा महिपाल याच्या ४२व्या वर्षांतील बलरामाची मूर्ती महत्त्वाची आहे. बंगालकडे मिळालेली ही धातुप्रतिमा (तूर्त बर्लिन संग्रहालय) दहा हाताची आहे. पण हिच्या उजव्या बाजूला सहा आणि डावीकडे फक्त चार हात दिसतात. उजवीकडचा सहावा अतिरिक्त हात थप्पड मारण्याच्या मुद्रेत उचलेला आहे. बलरामाची ही मुद्रा इतरत्र ही आढळते. इकडचाच एक हात आयुध पुरुषाच्या डोक्यावर आहे. प्रतिमेच्या दोन्ही बाजूला तालध्वज ही दिसतात. (रे.चि.वि.७)
useum for Indische Kunst, Berlin, Katalog 1986, p 45, 207
९) कृष्ण - पहाडपूर व नालंदा येथे कृष्णलीलेची दृश्यें मिळतात. त्यात नवनीत गोपाल, यमलार्जुन उद्धार, गोवर्धनधारण, केशीवध, कुवलयापीडवध वगैरे महत्त्वाची होत." मुरलीधर कृष्णाची द्विभुजमूर्ती तेराव्या शतकांपूर्वी मिळत नाही सुमारे तेराव्या शतकांतील वाकडा पाय ठेवून उभी असलेली, मागच्या हातांत चक्र व शंख घेतलेली व सामान्य हातांनी मुरली वाजवणारी सुंदर प्रतिमा ओडिसाच्या भुवनेश्वर येथील राज्य संग्रहालयांत आहे. ही विष्णुकृष्ण या नांवानें ओळखली जाते. ओडीसांत द्विभुज मुरलीधर कृष्णाला 'गोपीनाथ' असे ही म्हणतात. याच संदर्भात बंगलोरच्या संग्रहालयांत असलेल्या गोवर्धनधारी अष्टभुज मुरलीधर कृष्णांचा उल्लेख करावयास हवा. त्याच्या इतर हातांत माळा, गदा, चक्र व शंख ही दिसतात. काळ्या पाषाणाची ही प्रतिमा म्हणजे दक्षिण उत्तरेला साधणारा एक दुवा आहे.
१०) वरील विशिष्ट प्रतिमा शिवाय हरिहर-सूर्य; विष्णू-लोकेश्वर", चक्रपुरुषयुक्त विष्णू वगैरे प्रकारच्या मूर्तीही पूर्व भारतीय कलेत मिळतात. यापैकी शेवटली मूर्ती महत्त्वाची आहे. कारण दशभुज चक्रपुरुष, किंवा आशुतोष संग्रहालयांत असलेल्या पाषाणचक्रांचा उल्लेख शिल्परत्नांसारख्या सिद्धान्त ग्रंथात ही आढळतो व दक्षिणेंतही  त्यांचा प्रयोग होत असे. (IMC. छज. ३८५६ अ) वैकुंठ, सप्तरथ पीठावर उभा असलेला वीस हाती विश्वरूप व दशावताराच (IMC असलेले विष्णुपट" ही मिळतात. गरुडावर बसलेल्या लक्ष्मीनारायणाच्या आलिंगन मूर्तीचे बां वृद्धहारीतस्मृर्तीत आढळते.

गरुडारूढ विष्णू :

    लक्ष्मणकाटी (बरिसाल), बांगलादेश येथून प्राप्त झालेल्या सुमारे १२व्या शतकांतील गरुडारूढ विष्णूच्या साधारण उजव्या हातांत चक्र, डावीकडच्या हातांत दण्डासारखी बारीकशी स्त्री प्रतिमा (गदादेवी ?) असून उचलेल्या हातात गजलक्ष्मी आणि वीणाधारिणी सरस्वती (पुष्टी) दिसतात. देवाच्या मुकुटावर चर्तुभुज योगनारायण आहे. विष्णूसह लक्ष्मी व सरस्वती दाखविण्याचा हा नवा प्रकार आहे. (रे.चि.वि. ८)
Enamul Haque, IBBA., Pl. 16.5 p. 116
बंगालमध्ये शेषशायी प्रतिमेचे काही वेगळे प्रकार आढळतात. त्याचा संक्षेपात आढावा घेऊ.
- लक्ष्मीच्या डोक्यावर सर्पफणा
    आशुतोष संग्रहालय, कलकत्ता येथील सुमारे १२व्या शतकाचा शेषशायी नेहमीसारखा, पण त्याचे पादसंवाहन करणाऱ्या देवीच्या-लक्ष्मीच्या मस्तकावर सर्पफणा दिसतात.
Enamul Haque, Bengal., Pl. 63, p. 90
पायाशी गंगा बसलेली शेषशायी विष्णुची मुर्ती

- शेषशायी आणि विष्णूपदी गंगा
   बामनगोळा (मातदा) पश्चिम बंगाल येथेही ११व्या शतकांतील शिल्पांत वरीलप्रमाणे लक्ष्मीच्या माथ्यावर सापाच्या पाच फणा आहेत, पण तेथूनच देवाच्या डोक्याकडे जाणाऱ्या तीन किंचित नागमोडी अशा रेखा ही दिसतात. भट्टाचार्य यांच्या मतांप्रमाणें ही विष्णूच्या पायापासून निघणारी 'त्रिपथगा' गंगा आहे; आणि एवढ्यासाठीच ते सर्पफणा असलेली देवी लक्ष्मी नसून 'विष्णूपदी गंगा आहे असे विधान करतात. (रे.चि.वि.९)
- गौरीश्वर भट्टाचार्य यांचे 'ज्ञानप्रवाह' वाराणसी येथे दि. २३.३.०२ रोजी झालेले व्याख्यान. चित्रासाठी पहा- Enamul Haque, Bengal, Pl. 64, p. 91, 445

विष्णूपट :

    सेन, राजवटीत (सुमारे ११-१२वे शतक) बंगाल आणि आसाम मध्ये विष्णूपट निर्माण करण्याची पद्धत होते. सालरूपाने या पटांच्या दर्शनी भागावर लक्ष्मी-सरस्वती, कचित गंगा यमुनेसह, विष्णु, गरुड, विद्याधर असता पाठीमागे दशावताराचे अंकन करतात.
Gaurishankar De, Visnupatta Kala VIII Figs. 43-45, pp. 153-56
रायगंज (उत्तर दीनाजपुर) पश्चिम बंगाल येथील लक्ष्मीनारायण

लक्ष्मीनारायण -

   रायगंज (उत्तर दीनाजपुर) पश्चिम बंगाल येथून मिळालेली सुमारे १२ व्या शतकातील मिळालेली प्रतिमा विषेश उल्लेखनीय आहे, कारण येथे विष्णूचा पाय गरुडावर पण लक्ष्मीचा मात्र घुबडावर विसावलेला आहे. लक्ष्मीचा घुबडाशी संबंध बंगालकडे विशेष आढळतो.
Gauriswar Bhattacharya, 'The Vaisnava Images from Bengal, Problem with JPRB., XII 2008-09, Fig. 2-6 pp. 5-8

जगन्नाथ -

    विष्णूचा नववा अवतार म्हणून काही ठिकाणी बुद्धाच्या ऐवजी जगन्नाथाची गणना करतात. पुरीचा जगन्नाथ ओडिसांत फार लोकप्रिय आहे. याचा सर्वात प्राचीन शिलालेखीय उल्लेख राजा भुवनदेव गंग याच्या इ.स. १३१० च्या लेखांत सापडतो. शिल्पांचा विचार केला तर सुमारे इ.स. च्या १२५० ची चार शिल्पें आपल्या माहितीत आहेत. जगन्नाथ (म्हणजे पुरुषोत्तम), शिवलिंग आणि महिषमर्दिनी दुर्गा यांचे एकत्र अंकन आहे. (रे.चि.वि. १०) या शिल्पांपैकी एक कोणार्क येथील संग्रहालयांत आहे. यांत राजा नरसिंह याला उपासकाच्या रूपांत दाखवले आहे. मुळांत शाक्तसंप्रदायाच्या या तीन प्रतिमा सन् १२७८ च्या अगोदच वैष्णव संप्रदायांत परिवर्तित झाल्या. कृष्ण-बलरामाबरोबर असलेली बहिण- एकांनशा = दुर्गा - ही सुभद्रेच्या रूपांत दिसू लागली; या विधानाचा आधार भुवनेश्वर येथील अनंतवासुदेव मंदिरात असलेला एक शिलालेख आहे. वैष्णव जगन्नाथत्रयीची एक सुंदर मूर्ती १४व्या शतकात निर्माण झालेल्या लिंगराज मंदिर (भुवनेश्वर) याच्या परिसरांत आहे. येथे हाताचे ऐवजी फक्त दंड दिसतात, कोपरापुढचा भाग नाही.
 जगन्नाथ पुरी येथील मुर्ती

  H. Kulke, 'Some Remarks about Jagannath Trinity sudasian Institute Der Universitat, Heldelberg no. 147, weisbaden 1973 Fig. 126, pp. 126-39

जगन्नाथ-नरसिंह :

     जानला (पुरी) ओडिसा येथील एका छोट्याश्या मंदिरांत भिंती वरील शिल्पात (सुमारे १७-१८वे शतक) योगपट्टासनांत बसलेल्या लक्ष्मीनरसिंहाच्या माथ्यावर क्रमाने सुभद्रा व बलराम यांचे अंकन आहे. नरसिंहाच्या अतिरिक्त हातांत चक्र व शंख असून मांडीवर कमळे घेतलेली लहानशी लक्ष्मी आहे. वर दिसणाऱ्या सुभद्रेला साधारण हात नाहीत, पण' अतिरिक्त हातांत तिने पद्म व शंख (?) घेतले आहेत, सर्वांत वर असलेल्या सर्पफणांकित बलरामाजवळ नांगर आणि मुसळ आहे. 
जगन्नाथ-नरसिंह मुर्ती

    अशा प्रकारच्या शिल्पाचे निर्वचन करणारी एक कथा स्कंदपुराणाच्या वैष्णव खंडातील पुरुषोत्तम माहात्म्यात मिळते. राजा इंद्रद्युम्न याने जगन्नाथाच्या काष्ठ प्रतिमेच्या प्रतिष्ठेसाठी पुरोहित म्हणून ब्रह्मदेवाला बोलावले. त्या अनुष्ठानांत ब्रह्मदेवाने 'मंत्रराजा' चा उच्चार केला. त्यामुळे तेथे कृष्णाच्या जागी नरसिंह प्रगट झाला. (रे.चि.वि.१०')
    H.V. Steiten Cron, 'Jagannatha Narasimha: A Unique Syneritishe stone image based on an episode from Skandapurana.' Journal of the Orissa Research Society 1, 1981, October, Figs. 1, 2, p. 3

विश्वरूप :

    सुमारें ११-१२ व्या शतकांत घडवलेल्या पूर्वभारतीय कलेच्या दोन प्रतिमा उल्लेखनीय आहेत. पहिली शिवसर्या (कुशीनगर) उ.प्र. येथे एका बगीच्यात आहे. आठ हाताच्या या प्रतिमेचे काही हात खंडित आहेत. खड्ग, बाण, ढाल,धनुष्य यासारखी काही आयुधे ओळखता येतात. नेहमीप्रमाणे उजवीकडे सिंहमुख आणि डावीकडे वराहाचे मुख और पायाजवळ उजवीकडे लक्ष्मी आणि डाव्या बाजूला वीणा घेतलेली सरस्वती दिसते. पृष्ठशिळेवर वरच्या भागांत मधोमध ब्रह्या असून त्याच्या आजूबाजूस एक एक ऋषी आहे. एकाच्या हातांत कलश व दुसऱ्याच्या हातांत पोथी आहे. हे ब्रह्मदेवाचे लक्षणपुरुष (आयुधपुरुष?) असावेत. खाली पाच आडव्या ओळीत गणपती, स्कंद, शिव, नवग्रह, आदित्य, अकरारुद्र, आठ वसू, वगैरे कोरलेले आहेत. (रे.चि. वि. ११, ११')
विश्वरूप मुर्ती

     दुसरे शिल्प तिकडेच उजारनाथ नावाच्या गावाजवळ (कुशीनगर) एका टेकडीवर आहे. येथे वराह, मानव आणि सिंहमुखाशिवाय डाव्या खांद्याजवळ माशाचेही तोंड दिसते. देवाला आठ हात आहेत व त्यांत खड्ग, गदा, धनुष्य ही आयुधे स्पष्ट आहेत. एक हात बाणाचा भाता घेतलेल्या बाईच्या डोक्यावर ठेवलेला व दुसरा कमरेवर आहे. पृष्ठशिळेवर परिकर देवतांची गर्दी आहे. अगदी वर पद्मासनांत बसलेला चतुर्भुज वैकुंठ दिसतो. (रे.चि.वि. १२, १२').
A.L. Srivastava, Two Newly discovered Visvarupa Visnu Images from Uttar Pradesh, Kala XVI PI. 1, 2,3 pp. 6-14

गरुडारूढ वैकुंठ :

    १) सासमंदिर, नागदा, मध्य प्रदेश येथे सुमारे दहाव्या शतकांतला दशभुज वैकुंठ दिसतो. हातांत खड्ग, गदा, दंड, बाण, चक्र, धनुष्य, शंख आणि घट अशी आयुधे आहेत (रे.चि.वि. १३) उजवीकडचा एक हात मूळ चित्रांत दिसत नाही.
R.C. Agrawala, 'Narasimha, Varaha, Lalitkala, Pl. V, Fig. 15 p. 19
२) साराभाई फाउंडेशन रिट्रीट, अहमदाबाद येथे १६व्या शतकातील अठरा / वीस (?) हात असलेला गरुडारूढ वैकुंठ आहे. आयुधं तितकीशी स्पष्ट नाहीत, पण गदा, खड्ग, ढाल आणि घटाची ओळख पटते. (रे.चि.वि. १४)
३) शहाबाद, राजस्थान (कोटा संग्रहालय) येथील १०व्या शतकाची मुळांत चौदा हात असलेली प्रतिमा उल्लेखनीय आहे. या शिल्पात मांडीवर ठेवलेला डावा हात सोडला तर बाकी सर्व खंडित आहेत. पाच वराहमुख उजवीकडे आणि सिंहाचे तोंड डावीकडे आहे, म्हणजे नेहमीचा क्रम बदलेला आहे.
- मदनमोहन शास्री, 'कोटा संग्रहालय की विष्णु प्रतिमाएँ', Researcher V-VI, 1964-65, PI. XXIII, p. 95

 इंद्र- वैकुंठ मुर्ती

इंद्र-वैकुंठः

     पलेठी (ठेहरी-देवप्रयाग मार्ग) उत्तराखंड येथील सुमारे १०व्या शतकाच्या स्थानक वैकुंठ शिल्पांमध्ये मानवमुख व डावीकडे वराहमुख आहे, पण उजवीकडे मात्र सिंहाऐवजी सोंड उचलेल्या हत्तीचे तोंड आहे. त्यामुळे या प्रतिमेला इंड- वैकुंठ' असे सोयिस्कर नांव दिले गेले, पण त्यासाठी वाङ्‌मयीन पुरावा हाती आलेला नाही (रे.बि.वि. १५).
- राकेशकुमार श्रीवास्तव, वी.पी. बडौनी, ' इंद्रवैकुण्ठ प्रतिमा, पलेडी', Pragadhara 1, P. 1, p. 43

नरसिंह :

    नरसिंह मंदिर, नरसिंहगढ (राजगढ) म.प्र. येथे तूर्त पुजेत असलेल्या १९व्या शतकांतील या प्रतिमेत देवाच्या मांडीवर लोळलेल्या हिरण्यकश्यपूचे तोंड हरिणाचे दाखवले आहे. अर्थात् सिंह आणि हरिणाच्या नैसर्गिक शत्रुतेचा येथे खुबीने उपयोग केला आहे (रे.चि.वि. १६).
L.S.Nigam, 'A Rere Metal Image of Narasimha from Narasinhgarh, Madhya Pradesh'

चतुर्भुज राम व द्विभुजाशस्रधारिणी सीता, इंदूर, मध्यप्रदेश

चतुर्भुज राम व द्विभुजाशस्रधारिणी सीता :
   इंदूर, मध्यप्रदेश येथे राजेन्द्रकुमार सेठी यांच्या संग्रहात असलेल्या या मध्यकालीन ताम्र प्रतिमेत राम व सीता जोडीनें उभे आहेत. धनुष्यबाण घेतलेल्या रामाच्या अतिरिक्त हातांत तलवार व ढाल आहे. हीच दोन आयुधं सीतेनही आपल्या हातांत घेतली आहेत (रे.चि.वि. १७).
-लेखकाची नोंद, सौजन्य, श्री. सेठी, इंदूर.

काही विशिष्ठ कृष्णलीला :

१) ओसियों, राजस्थान येथील मध्यकालीन सूर्यमंदिरात असलेल्या लीलादृष्यांत नुकत्याच जन्मलेल्या बाळकृष्णाला घेऊन वसुदेव घोड्यावर बसून सरळ नगरद्वारातून बाहेर पडताना दिसतो. पुढील दृश्ये बरीच नेहमी सारखी आहेत (रे.चि.वि.१८, १८').
२) शहडोल, मध्यप्रदेश येथे ठाकुर साहेबांच्या संग्रहात असलेल्या एका शिलापटांवर सोळा दृष्यें उत्कीर्ण आहेत. त्यांत अनंताच्या (शेषाच्या) मांडीवर श्रीकृष्ण, कंसावर त्याचे आक्रमण, कृष्ण-बलरामाची वसुदेव, देवकी, उग्रसेन यांच्याशी भेट, यमुनेच्या तटावर कंसाची उत्तरक्रिया, वगैरे अन्यत्र क्वचित आढळणारी दृश्ये आहेत. (रे.चि.वि. १९, १९')


कृष्ण-बलरामाचे एकच अंकन :
१) सूर्यमंदिर, ओसियाँ, राजस्थान येथे गरुडावर बसलेले चतुर्भुज कृष्ण व चार हाताच्या बलरामाचे अंकन आहे. शिवाय देवी एकानंशा आणि पुरीचा जगन्नाथ या शिल्पांत ही दोघे भाऊ एकत्र आढळतात.
R.C. Agrawala, Unpublished A.A. Tome XI, Fac. 2, 1965 p. 57 fn.I. BMA., 51- 52 pp. 7-13
२) पंजाब आणि हरियाणा या भागांत विष्णू प्रतिमेत कक्षा-सखीच्या रूपांत उजवीकडे असलेल्या श्रीदेवीच्या पाठीकडे नांगर व मधुपात्र घेतलेल्या बलरामाला अंकित करण्याची पद्धत लोकप्रिय होती. अशा प्रकारच्या जवळ जवळ वीस प्रतिमा हरियाणांत मिळाल्या आहेत.
Devendra Handa, 'Balarama as Attendant of Visnu' Proceedings of the K.R. Sant Memorial Seminar on Indian Culture, Philosophy and Art, Ed. Dr. Bharati Shelet B.J. Institute of Learning and research, Ahmedabad, 2001, pp. 100-108, Fig. 3-12

शेषशायी आणि शिव :

   थानेश्वर, हरियाणा येथून मिळालेल्या शेषशायी प्रतिमेत (तूर्त कुरुक्षेत्र विद्यापीठ संग्रहालय) देव नेहमीसारखा असला तरी एकतर त्याच्या बेंबीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेव दिसत नाही व दुसरे म्हणजे देवाच्या चक्राजवळ पर्व घेतलेला सूर्य आणि त्याच्या उजवीकडे उमामहेश्वर बसलेले दिसतात. (र.चि.वि. २०)
D. Handa, SFH., Pl. 70 (misprint 72) p. 60

वैकुंठ बिंबब्रह्म :

   चतुर्ग्यूह मूर्तीला 'वैकुंठ' किंवा 'बिंबब्रह्म' असे म्हणता येईल. बिंब म्हणजे मूर्ती, व ज्या बिंबाच्या उपासनेने ब्रह्मज्ञान म्हणजे मोक्ष प्राप्ती होते ते बिंबब्रह्म, देगलूरकर वैकुंठमूर्तीला बिंबब्रह्म म्हणतात.
- विस्तृत चर्चेसाठी, गो. बं. देगलूरकर, 'विष्णुमूर्ते नमस्तुभ्यम्', पा. ७८-७९
 
 विष्णु- ब्रम्हा मुर्ती

विष्णू-ब्रह्मा :

    या दोन देवांना एकत्र दाखवणाऱ्या दोन प्रतिमा समोर आल्या आहेत. दोन्हीचे प्राप्तिस्थान हरियाणा प्रदेश आहे व दोन्ही समकालीन म्हणजे सुमारे दहाव्या शतकातील आहेत (तूर्त पुरातत्त्व संग्रहालय विभाग, चंडीगढ), एकीत देव पोथी, घट व शंख घेऊन बसला आहे. बैठकीवर दोन पक्षी (गरुड, हंस ?) दिसतात, दुसऱ्या शिल्पांत दर्शनीभागावर जानवे आणि जटाजूट असलेला ब्रह्मदेव आणि पाठीकडे मुकुट घातलेला विष्णू आहे. दोघांचे ही हात, आयुधे, वगैरे खंडित आहेत. (रे.चि.वि. २१)
D. Handa, 'An Addorsed Image of Hari-Brahma', JGSV, 1988, XLI, January December 1985, Pl. 1-4, pp. 193-97 

विष्णू-कुबेर :

    हरियाणातून सुमारे १०व्या शतकातील मिळालेली विष्णू-कुबेराची मिश्रमूर्ती गुरुकुल झझ्झर येथे आहे. देव हातांत फळ, गदा, पद्म व नकुलक (पैशाची पिशवी) घेऊन बसलेला आहे. (रे.चि.वि. २२).
दुसरी प्रतिमा पिंजोर येथून मिळाली होती, पण ती आता बेपत्ता आहे.
D. Handa, SFH, Fig. 269, 268, p. 199, 198
अष्टभुज विष्णू मुर्ती अधिकेश्वर पेरुमल मंदीर ( कांचिपुरम )
अष्टभुज विष्णू :
    काश्मीर कलेचे सुमारे १०व्या शतकातील हे शिल्प तूर्त बर्लिन संग्रहालयात आहे. गरुडावर आरूढ या आठ साहे विष्याच्या हातांत पय, खङ्ग, शंख (?) चक्र(?), (?), पद्म आणि कलश ही आयुध दिसतात. गरुड ही चतुर्भुज आहे. त्याचे साधारण हात नमस्कार मुद्रेत असून अतिरिक्त हातांत उजवीकडे कमळ आणि याचे दिसतात, आहे. (र.वि.वि. २३)
R.C. Agrawala, 'Unpublished Sculptures and Terracottas in the National Museum. New Delhi and some Allied Problems', EW., 17/3-4, 1967 Fig. 10 p. 278

शेषषायी :

  शेषावर शयन केलेल्या विष्णूचे खालील प्रकार उल्लेखनीय आहेत :
१) छोबरी, छोटीलाजवळ (गुजराथ) (तूर्त वाटसन संग्रहालय, राजकोट) येथील शेषशायी नेहमी सारखा असला तरी पायाजवळ लक्ष्मीशिवाय एक दुसरीही स्री दिसते. ही भूदेवी असावी, शिल्पाच्या भागावर समुद्रमंथनाचे दृश्य आणि नऊ घागरी दिसतात.
 
 
Swarna Kamal Bhowmik, 'Some Visnu stone images in the watson museum', BMA, XXIII, 1971, PI. LIII, Fig. 2, p. 93
२) किशन विलास, राजस्थान येथील शेषशायी विष्णूच्या बेंबीतून निघणारे कमळ आणि ब्रह्मदेवाचा अभाव आहे.
L.K. Jha, 'Kishan Vilas' Rajasthani Sculptures Marg, XII no.2, 1959, Pl. 8, p. 50
३) उम्रनारायण (चमोली) उत्तराखंड (तूर्त राज्य संग्रहालय, लखनऊ) नेहमीच्या शेषशायी, मधु आणि कैटभाचा सामना आयुध पुरुष करीत आहेत, खाली घागरी घेतलेले समुद्र, चोचीत मासे धरणारे पक्षी, किन्नर, किन्नरी, बगैरे दिसतात.
N.P. Joshi, Catalogue., II/1, Fig. 32, p. 212
  गरुडारूढ वैकुंठ मुर्ती

गरुडारूढ वैकुंठः

    चम्बा क्षेत्रातून मिळालेल्या (तूर्त भूरीसिंह संग्रहालय, चंबा) गरुडावर बसलेल्या वैकुंठाच्या हातांत पद्म (किंवा चक्र) आणि शंख असून त्याचे उपबाहू गदादेवी आणि चक्र पुरुषावर विसावलेले दिसतात. खाली असलेल्या गरुडाने आपल्या दोन्ही हातांनी विष्णूच्या पायांना टेकू दिला आहे, व त्याच्या पसरलेल्या पंखावर गदादेवी आणि चक्रपुरुष उभे आहेत (रे.चि.वि. २४).
    R.C. Agrawala, 'Narasimha Varaha Visnu Images.' Lalit Kala 16 PI. II, Fig. 6, p. 17 (चित्रांत वराहाचे तोंड बकऱ्यासारखे जास्त दिसते)

   वैकुंठलक्ष्मी मुर्ती

वैकुंठलक्ष्मी :

    वैकुंठ आणि त्याच्या डावीकडे उभी असलेली लक्ष्मी दाखवणाऱ्या सुमारे ७ व्या शतकातील मूर्ती हरियाणा आणि चंडीगढ क्षेत्रांत मिळाल्या आहेत.
D. Handa, SFH, PI. 36, pp. 70-71
    काश्मीरच्या एका शिल्पांत (सुमारे ९वे शतक) वैकुंठ लक्ष्मीला मांडीवर घेऊन बसला आहे. पाठीकडे राक्षसासारख्या एका विकराल मुखाचे अंकन आहे (र.चि.वि. २५, २५') हे काश्मीर परंपरेचे द्योतक आहे.
 
 
सपत्नीक वैकुंठ नेपाळमध्येही आढळतो. (पा. ११३).
Robert E. Fisher, 'Later stone Sculptures (ninth-twelfth centuries) Art and Architecture of Ancient Kashmir, Marg, Publication, Pl. 17

कालिय दमन स्थितीतील विष्णुच्या दोन मुर्ती

कालिय दमन :

      कृष्णाने कालिय (कालिया असाही प्रयोग रूढ आहे) नागाचे कसे दमन केले याबद्दल कलेत आणि वाङ्मयात दो प्रकार आढळतात. प्रथम म्हणजे कष्णाने त्याला आपल्या सामथ्यनि दमवले. जेरीस आणले व नंतर त्याच्या फ कृष्णाने यमुनेत उडी टाकल्याबरोबर तेथे उगवलेल्या होवा कुश याचा) फास तयार केला व तो नागाच्या फणांवर टाकला आणि त्याला 'जेरबंद' केला व त्याच्या प्राणा चढून नाचत वेणू वाजवीत वर आला. हिंदी भाषेत या प्रकाराला 'नाथना' म्हणजे व वेसण घालणे असे म्हणतात वाराणसी येथे अत्यंत प्रसिद्ध असलेल्या या लीलेला 'नाग नथैया' असे नांव आहे. मथुरा, खजुराहो, आबू, वगैर ठिका आणि महाराष्ट्रांतही काही चित्रांत वेसण घातलेला नाग दिसतो. हनुमानढोका, नेपाळ येथील एका सुंदर शिल्पांत कृष्ण मुठीत गवताची/दर्भाची जुडीच घेतलेली आहे. (रे.चि.वि. २६).
Pratapaditya Pal. 'The Art of Nepal' Part I, Sculptures Leider 1974, Pl. 90-91
     केरळ आणि तामिळनाडू या राज्यातून कृष्णाची काही वेगळी रूपे समोर आली आहेत. सुमारे १४-१७ बा शतकांतील या स्वरूपांची ही संक्षेपात चर्चा कंरू

कृष्णाभिषेक :

     पद्मासनांत बसलेला सहा किंवा आठ हाताचा मुरलीधर याच्या हातांत वेणू शिवाय पद्म, शंख, चक्र, गदा है आयुर्धे व आठ हात असले तर दोन समोर एकावर एक ठेवलेले दिसतात. देवाला त्याच्या बायका किंवा गोपी घासाने स्नान घालीत असतात. अशा प्रकारची काष्ठ शिल्पें थाली (कोजीकोडी) येथील कृष्णमंदिरात तसेच सुचिंद्रम् मंदिराच्या लाकडी रथावर ही आढळतात. (रे.चि.वि. २७)
S.K.R.Rao, Visnukash Banglore, p. 272, 286; Preeta Nayar, 'Some Rase Sculptures of Krsna from Kerala with one hither to undesturbed form, Kala XV 2009-10 Fig. 2 on p 113

योगेश्वर मुरलीधर :

    याचे वर्णन शिल्परत्नांत आहे. मुरलीशिवाय शंख, चक्र, गदा आणि पद्म घेऊन हा द्वारावतीच्या मंडपात बसलेले असतो. दोन हात मांडीवर योगमुद्रेत असतात. कचित याला फक्त सहाच हात असतात. असे काष्ठशिल्प किया सुब्रह्मण्य मंदिर (कोट्टयम्) केरळ येथे आहे (रे.चि.वि. २८).

मदनगोपाळ :

      शंख, चक्र, पद्म, अंकुश आणि पाश ही होत. कामदेवाची दोन आयुधं त्याचे 'मदनगोपाल' हे नांव सार्थक करतात त्याची आयुधे मुरली, ऊसाचे धनुष्य, त्याच्या प्रतिमा येनकशी (येनाक्षी?) (थिरूवेलवेली), अलगरकोविल, मदुराई, वरदराजस्वामी मंदिर, लिटिल कांजीयन वगैरे ठिकाणी विद्यमान आहेत.
    योगेश्वर मुरलीधर आणि मदनगोपाल याचे संयुक्तरूप वइझहपल्ली (कोट्टयम्) येथील शिवमंदिरात आहे. पद्मासनांत बसलेल्या या दशभुज कृष्णाच्या हातांत मुरली, ऊसाचे धनुष्य, फुलाचा बाण, चक्र, शंख, अंकुश आणि पाश ही आयुर्धे असतात व दोन हात योगमुद्रेत मांडीवर ठेवलेले दिसतात. (रे.चि.वि. २९).
- वरील तीन प्रतिमांच्या विस्तृत चर्चेसाठी प्रीता नायर यांचा वर नोंदलेला 'कला १५ मधील लेख : Kala 15,
Fig. 1-4, pp.108-15

शिवपूजक विष्णू-

     सिद्धेश्वर मंदिर, हवेरी (धारवाड), कर्नाटक येथील सुमारें ११व्या शतकाच्या शिल्पांत सहा हाती विष्णू शिवलिंगाचे (कदाचित पार्थिव) पूजन करताना दिसतो. (रे.चि.वि. ३०)
R.Sengupta' Surya Visnu etc.' Journal of Oriental Research, XXVIII, 1-4, 1958-59, Pl. 2, pp. 19-21

शेषशायी :

       महिषासुर मंडप, महाबलीपुरम् येथे असलेला सुमारे ७व्या शतकातील अनंतशायी फक्त दोन हाताचा आहे. उजवा हात शेषाच्या अंगावर आणि डावा कोपऱ्यापर्यंत उचलेला आहे. पादसंवाहिका लक्ष्मी व ब्रह्मदेव दोघेही नाहीत (रे.चि.वि. ३१).





नृत्यमग्न विष्णुच्या विवीध मुर्ती

नाचणारा विष्णू-नृत्य विष्णू :

       नाचणारा गणपती, कृष्ण किंवा देवी प्रतिमा या सामान्य आहेत, पण नृत्य करणारा विष्णू दुर्मिळ आहे. हुमचा (शिमोगा) कर्नाटक येथील पंचबसदी मंदिराच्या परिसरात आठ हाताचा नाचणारा विष्णू आहे. त्याचे दोन हात अभयमुद्रेसह नृत्यमुद्रेत आहेत, दोनमध्ये चक्र व शंख आहे. पसरलेल्या दोन हातांत नाचणाऱ्या बारीक पुतळ्या आणि वर उचलेल्या दोन मध्ये नमस्कार मुद्रेत उभे असलेले पुरुष दिसतात. पायांजवळ साथीदार म्हणून झांज वाजवणारा शंकर (खूण म्हणून त्याचे खट्ठांगवर वेगळे दिसते) आणि घट वाजवणारा चतुर्भुज ब्रह्मा आहे. याशिवाय श्रीदेवी, भूदेवी, उडणारे विद्याधर ही आहेत. (र.चि.वि. ३२).
Sarvamangala if Three unique Sculptures from Humcha Region, Shimoga Kamataka', Proceedings of Indian Art History Congress, 13th session, Allahabad 2004, Fig. 1, pp. 56-64

अर्धनारी विष्णुरुपः -
  आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यातील सिंगनमाला परिसरातील सालकाम चेरुवु गावात एक पुर्ण उंचीचे अतिशय दुर्मिळ पाषाण मुर्ती आहे. हि मुर्ती १९९५ मध्ये सापडली, या प्रकारच्या मुर्तीला सत्य वेणुगोपाळ म्हणतात. नरकासुर संहार प्रकारची हि मुर्ती सोळाव्या शतकातील विजयनगर साम्राज्यात घडवलेली मुर्ती आहे. 

पंचमुख नरसिंह :

     श्री वरदराजस्वामी, कांजीपुरम्, तामिळनाडू येथील रथावरील एका शिल्पांत पाच तोंडे आणि दहा हात असलेला आसनस्थ नरसिंह दिसतो. वर्णनांत यक्षमाला, मुसळ, पद्म, कमंडलू, चक्र, वगैरे आयुधांचा उल्लेख आहे, पण चित्रांत फक्त शंख स्पष्ट दिसतो. (रे.चि.वि. ३३-वर्णनाप्रमाणे काढले आहे).
Raju Kalidas, 'Iconography and Symbolism of Panchmukha Narasimha' EW., 37 no. 1-4, 1987 1987, fig.1 p. 283

बुध्दावतारातील विष्णु

बुद्धावतार, मायामोह :

       बुद्धाला म्हणजे विष्णूच्या नवव्या अवताराला पुराणांप्रमाणे मायामोहाचे रूपांत खोट्या शास्राचा प्रचार करून करण्याची पद्धत असावी. या संदर्भात असुरांना भ्रमित कोष्ठराय' या नावाने प्रसिद्ध असलेले शिल्प उल्लेखनीय आहे. येथे उजव्या हातांत अभय व माळा आणि काचा बबीखाली ठेवून सिंहासनावर बसलेला बुद्ध दिसतो. पाठीमागे वृक्ष आणि आजुबाजूला चामरधारी उभे आहेत. वशेष म्हणजे आसनाच्या वरच्या बाजूला चक्र आणि शंख दाखवून त्याचा विष्णूशी संबंध सूचित केला आहे. (र.चि.वि. ३४)
    B.V. Shetty, 'An Image of Buddhavatara of Visnu at Badami, Nirgrantha 1 Ahmedabad 1945 Pl. 1, pp. 89-91

शेषशायी :

    पवनार (वर्धा) महाराष्ट्र येथील सुमारे ५व्या शतकातील शेषशायी आठ हाताचा आहे. आयुधें मात्र चक्र व शंख एवढीच दिसतात. आठहाती शेषशायीचा उल्लेख लिंगपुराणांत (लिंग. पूर्वार्ध, २०.३.४ पा. ४८) मध्ये आहे. पवनारची ही प्रतिमा बरीचशी निसर्गहृत आहे (रे.चि.वि. ३५).
A.P. Jamkhedkar, Iconography of Visnu in Maharashtra (from earliest to 10th century A.D.) collo Pl. VIII, p.113







शेषशायी आणि शिव :
     सातारा, महाराष्ट्र येथील परिसरांतील मध्यकालीन शेषशायी बराचसा खंडित असला तरी महत्त्वाचा आहे. लक्ष्मी अस्पष्ट आहे व डावीकडे खालील कोपऱ्यात गरुड आहे. या शिल्पांत खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत :
- ब्रह्मदेवाच्या डावीकडे तीन सर्पफणा आहेत, जवळच उजवीकडे तोंड केलेला पण डोक्यावर एक सर्पफणा असलेला पुरुष (?) दिसतो.
- ब्रह्मदेवाच्या उजवीकडे झाडाखाली बसलेला एक ऋषी आहे.
-शेष असलेल्या पलंगाच्या खाली ओळीने नऊ शिवलिंगे आहेत. हे शिल्प हरिहराच्या एकात्मतेकडे संकेत काँत इतरही काही सांगू इच्छिते, पण तूर्त तरी ते अस्पष्ट आहे (रे.चि.वि. ३६).
(मूळ चित्रासाठी लेखक डॉ. गो. बं. देगलूरकर यांचा आभारी आहे.)
 
 

पांडुरंग/विठ्ठल :

-विठ्ठलासंबंधी विशेष चर्चेसाठी पहा, देगलूरकर, विष्णुमूर्त नमस्तुभ्यम् पाने ७२-७४- रा.चिं. ढेरे. श्री विठ्ठल एक महासमन्वय, पुणे.
Haripriya Rangrajan, 'The Unique Iconographic Features of Panduranga Vithoba in Pandharpur', P.N. Naidu. 'The Cult. of Vitthala', G.B. Deglurkar, Iconography of Vitthala, a Reappraisal all in Jnana Pravaha Jaurnal XIII (200-10)

दिल्ली नॅशनल मुझियम मधील संकर्षण (विष्णू) मुर्ती :-

भारतीय संस्कृतीचे अनेक पैलू आणि वैशिष्ठ्य आहेत, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मूर्तींची पूजा. परकीय आक्रमणे सुरू झाली आणि आपल्याकडे होणारी वैचारिक प्रगती थांबली, यामुळेच शिल्पकला याकडे दुर्लक्ष झाले. नंतरच्या काळात परकीय अभ्यासकांनी भारतीय शिल्पांची वर्णने ही बीभत्स किंवा भयंकर शिल्पं असतात आणि यापलीकडे याला काही महत्त्व नाही अशी केली. आपले साहित्य शब्दशः भाषांतर करून मूळ मुद्द्यापासून लांब नेले. आपल्याकडच्या अनेक साहित्यिकांनी आणि अभ्यासकांनी हीच री पुढे ओढली. पण डेक्कन कॉलेज चे सांकलिया सर, डॉ. नि. पु. जोशी, डॉ. देगलूरकर, डॉ. जामखेडकर, डॉ. ढवळीकर, किरीट मंकोडी अशा अनेक अभ्यासकांनी या कलेच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कै. उदयन इंदूरकर सारख्या माणसांनी जनमानसात हा विषय रुजवला.
शिल्प किंवा मूर्ती हे आपल्याकडे साध्य नसून साधन आहे त्या पाठीमागे लपलेल्या संकल्पनेला समजून घेण्यासाठीचे. तीन महत्त्वाच्या देवांपैकि एक म्हणजे विष्णू. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील याचे अनेक उपासक आहेत. जगातले सगळ्यात मोठे विष्णू मंदिर हे भारतात नसून बँकॉक पासून जवळ असलेल्या कंबोडिया नावाच्या देशात आहे. मूर्तीच्या मागे लपलेल्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर आधी ती मूर्ती समजून घेणे गरजेचे आहे. या फोटो मध्ये असलेला विष्णू आता बघुयात. डावीकडून बघताना हातामध्ये कौमोदकी नावाची गदा दिसते, पांचजन्य शंख, डोक्यावर प्रभावळ आणि किरीट मुकुट, पद्म किंवा कमळ आणि सुदर्शन चक्र अशी आयुधे आहेत. छातीवर श्रीवत्स नावाचे चिन्ह दिसते आहे. 'अहिर्बुध्न्य संहिता ' नावाच्या उपनिषद ग्रंथात विष्णूच्या हातांचा आणि आयुधांचा नक्की अर्थ काय आहे याचे वर्णन आले आहे. विष्णू हा मत्स, कुर्म, वराह, वामन, इत्यादी अनेक अवतरांमध्ये दिसतो. भक्तीचे महत्त्व समाजात पसरवण्याचे खूप मोठे श्रेय हे या वैष्णव संकल्पनेला जाते.

मध्य आणि पश्चिम भारतीय कलेंत विष्णू :

क्षेत्र व विस्तार :

     या भागांचे विस्तार क्षेत्र इतरांच्या मानांने फार विस्तृत आहे. यांत पश्चिमी उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजराथ आणि मध्यप्रदेश यांचा बराचसा भाग येतो. हे विस्तार क्षेत्र भौगोलिक दृष्टीनें जरी मोठे असले तरी मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने यातील काही ठोकळ केंद्रांचा अभ्यास केल्यास या क्षेत्रांतील वैशिष्ट्यांचे बरेचसे आकलन होतें. ही ठोकळ केंद्रे म्हणजे खजुराहो, कन्नौज, राजस्थानांतील ओसिया, जगत, एकलिंगजी, अहाड, किराड, आभानेरी, इत्यादि मंदिरांतील शिल्पें होत. राजस्थानांतील महाराणा कुंमा याची कारकीर्द महत्त्वाची होती. कुंभामगढ येथील उदयपूर संग्रहालयांत असलेल्या ब्राह्मण धर्माच्या संगमरवरी प्रतिमा या दृष्टीनें उपयोगी आहेत. गुजराथ राज्यातील शामळाजी, कारवण, मोढेरा, आबू, कैरा, सोमनाथ, इत्यादि ठिकाणची शिल्पसंपत्ती अध्ययनीय आहे. या सर्व केंद्रांची विस्तृत चर्चा, तेथील मूर्तीची सिद्धांत ग्रंथांच्या मदतीनें तपासणी वगैरे गोष्टी या ग्रंथांत शक्य नाहीत. तेव्हां या प्रतिमांची साधारण वैशिष्ट्ये व विशेष महत्त्वाच्या प्रतिमा यांचा आढावा घेणेच प्राप्त आहे.

     येथील कलेचा अभ्यास करतांना हे लक्षांत ठेवले पाहिजे की इकडील काही भागांत ओडिसाप्रमाणेंच उत्तर व दक्षिण भारतीय कलेचा संगम घडला आहे व दोन्ही कडून देवाण घेवाण झाली आहे. विशेषकरून चालुक्य व राष्ट्रकूट राजांच्या राजवटीत याला बराच वाव मिळाला.

विष्णुप्रतिमांची वैशिष्ट्ये :

      या भागांतील विष्णुप्रतिमांचा साकल्यानें अभ्यास केल्यास खालील गोष्टी ठळकपणें डोळ्यांत भरतात.
     १) रथिका - मध्यकालीन विष्णुमूर्तीच्या रचनेचा आपण मागें विचार केला आहे. (रे.चि. फलक अकरा) त्यांत 'रथिका' आणि 'रथिका बिंब' याचा उल्लेख झालेला आहे. पूर्व भारतीय कलेत न दिसणाऱ्या रथिका आतां प्रगट होतात. विष्णुप्रतिमेंत उजवीकडील रथिकेंत ब्रह्मदेव व डावीकडे शंकर असतो. मध्यरधिका असली तर तेथे विष्णूचे दर्शन घडते. खजुराहो येथे दिसणाऱ्या रथिका बिंबाचा विष्णू बहुतेक मांडी घालून बसलेला असतो. त्याच्या मागील हातांत आयुधें, चक्रशंख किंवा गदा, चक्र, वगैरे असतात पण साधारण हात मात्र बेंबीचे खाली मांडीवर ठेवलेले असतात. या प्रकारांस 'योगनारायण' या नांवाने ओळखतात. योगनारायणांच्या स्वतंत्र मूर्तीही विचाराधीन क्षेत्रांत मिळतात (चित्र ३२).
     काही ठिकाणीं मध्य रथिर्केत अशाच प्रकारची प्रतिमा असते पण मागील हातांत इतर आयुधे नसून फक्त पर्यो असतात. हे सूर्याचे लक्षण असल्यामुळे या प्रकारांस 'सूर्य नारायण' म्हणून ओळखले जाते.
    काही मूर्तीत पूर्ण रथिका न दाखवता फक्त तिचा ओटा दाखवून त्यावर रथिका बिंब अंकित करतात.
२) आयुधें - या बाबतीत डोळ्यांत भरण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे, पद्म किंवा कमळाचे दर्शन ही होय, बंगाल व ओडिसाकडे पद्म आढळत नाही पण इकडे मात्र ते बरेच प्रामुख्यानें दिसते. पद्माबरोबरच पद्मपुरुषही दिसतो. याप्रमाणें आतां विष्णूची चारी आयुधे शंखचक्र गदा पद्म बऱ्याचदा दृष्टिगोचर होतात. कित्येकदा त्यांचा क्रम पद्म, गदा, चक्र व शंख असा असतो.

     या आयुधांबरोबरच फळ, अक्षमाळा आणि घट या वैष्णव वस्तूंचा विचार करावयास हवा. त्यापैकी पर या आयुध्या मिळते. डॉ. अवस्थी यांच्या मताप्रमाणें खजुराहो येथे फळ घेतलेल्या फक्त दोनच प्रतिमा आहेत." अक्षमाळा फळांपेक्षा जास्त आहे. ही वरदमुद्रेत असलेल्या सामान्य उजव्या हातांत असते. खजुराणो येथे उजव्या हातांत अक्षमाळा असल्यास डाव्यांत बहुतेक घट असतो. गरगरीत आणि बुटक्या वामन- विष्णूच्या हातात या वस्तू बऱ्याच ठिकाणी दिसतात.
    ३) साधारण हात - विष्णूच्या साधारण उजव्या हातांकडे लक्ष द्यावयास हवे. कुषाणकाळांत हा अभयमुद्रेत असे, गुप्तकाळांत तो कधी फळ घेऊन खाली आला तर कधी तो आयुधपुरुषांच्या डोक्यावर झळकू लागला. पूर्व भारतीय कलेत हा वरदमुद्रेत दिसतो. मध्यभारतीय कलेत काही ठिकाणी कुषाण परंपरेचे पुनर्जीवर झालेले दिसते. खजुराहो येथे अशा प्रकारच्या सात प्रतिमा असल्याचे नमूद आहे. सुलतानपूर (उ.प्र.) येथून अशा पद्धतीची एक फारच सुंदर प्रतिमा मिळालेली आहे. (ल.स.ओ. १९९) (चित्र २३) माळव्याकडील बऱ्याच मूर्तीत उजवा हात वरदमुद्रेत असून त्यांत अक्षमाळा अडकवलेली असते. अशा मूर्ती भानपुरा, हिंगलाजगढ, वगैरे ठिकाणी मिळाल्या आहेत.
खजुराहो येथे काही प्रतिमांत डाव्या हाताला कट्यवलंबी दाखवून कुषाण परंपरेचे अनुसरण केलेले दिसते.
    ४) दागिनें (चित्र २३,२३) - मध्यम उंचीचा करंडक मुगुट, चक्रकुंडलें, मणिकुंडलें, नक्षीदार कुंडलें (क्वचित सर्प कुंडलें; ल.सं.सं.ओ. १९९) मण्यांचे, मोत्यांचे किंवा टपोरी गाठ असलेले सोन्याचे जानवे (हेमसूत्र), मोठ्या शंकरपाळ्याच्या आकाराचे श्रीवत्स आणि गुडघ्यापर्यंत लोंबणारे सर किंवा साखळ्या असलेली मेखला हे मध्यभारतीय विष्णूंचे मुख्य दागिने होत. या व्यतिरिक्त पायांतील चाळ व नूपुरें यांचाही उल्लेख करावयास हवा. काही मूर्तीत विष्णूच्या पायाच्या बोटांत घातलेल्या अंगठ्या दिसतात. मध्यकाळाच्या पूर्वी वयस्क पुरुषांच्या पायांत कोणताही दागिना दिसत नाही. विष्णूच्या दागिन्यांचे वाङ्‌मयीन उल्लेख ही आढळतात. "
५) परिवार देवता - या सदरांखाली बऱ्याच देवतांचा समावेश होतो. त्यांचा क्रमानें विचार करू.

लक्ष्मी व गरूड :

    पूर्व भारतीय कलेत 'कक्षासक्त सखी'च्या रूपांत लक्ष्मी व सरस्वतीची जोडी दिसते. पण इकडे वीणा घेतलेली सरस्वती दाखविण्याची पद्धत नाही. अपवाद दिसलीच तर ती कोपराजवळ बारीकशा रूपांत दिसते. मध्यभारतांत सरस्वती ऐवजी हातात साप घेतलेल्या गरुड दिसतो. यांच्या स्थानांबद्दल खालील पद्धती रूढ होत्या -
१) विष्णूच्या उजव्या हातांखाली लक्ष्मी व डाव्याखाली गरुड आणि त्यांच्या पाठीशी आयुध पुरुष
(ल.सं.सं.0.275; 55.286, 42.189)
२) क्वचित या दोघांची स्थानें बदललेली दिसतात व कोणताच आयुधपुरुष दिसत नाही. ५८
३) विष्णूच्या हातांखाली आयुधपुरुष दाखवून त्यांच्या पाठीकडे लक्ष्मी व गरुड दाखविणें. यांत कधी लक्ष्मी उजवीकडे (ल.सं.क 109, 66.47) व कधी डावीकडे दाखवितात (ल.सं.56.352, 45.81). लक्ष्मी प्रमाणें गरुडही स्थान बदलतो.
   पृथ्वी-विष्णूची तिसरी पत्नी म्हणजे पृथ्वी. हिला बहुधा विष्णूच्या पायामधे चरणशिळेवर दाखवतात (चित्र ३४) ही कासवाच्या पाठीवर असलेली असून दोन नागांच्या मधे असते'" (ल.सं. 66.47). परंपरेप्रमाणे नाग हे पाताळाचे व पाण्याचे प्रतीक असून पृथ्वीचा आधार महाकूर्म आहे.

आयुधपुरुष :

   गदा ही स्त्रीरूपिणी असून शंख, चक्र व पद्म हे पुरुष रूपांत असतात, त्यांच्या स्थानांविषयीं मात्र आतां कोणताही दंडक असावा असें वाटत नाही. ह्या बाबतीत खालील पद्धती दिसतात
१) त्यांना लक्ष्मी व गरुडाच्या पाठीशी दाखविणें (चित्र ३४).
२) लक्ष्मी व गरुडाचे ऐवजी विष्णूच्या पायाच्या आजुबाजूस गदा व एक आयुधपुरुष दाखवून उरलेले त्यांच्या पाठीशी दाखविणें. अशा प्रकारच्या रचनेंत गदादेवी गदेच्याखाली येते. नगर (राजस्थान) येथे मिळालेली अशी एक प्रतिमा उल्लेखनीय आहे, कारण या प्रतिमेत पायांजवळ उभ्या शंखपुरुषाच्या डोक्यावर शिरस्राण व पायांत जोडे आहेत. चक्रपुरुषाने अशाच प्रकारची टोकदार टोपी घातली आहे. आयुधपुरुषांच्या या वेषांवर मध्यएशियाची छाप आहे.
३) विष्णूच्या पायाजवळ शंख व चक्रपुरुष उभे दिसतात व त्यांच्या पाठीकडे लक्ष्मी आणि गरुड असतात (ल.सं.66.47; एच् 109).
४) जर दोनच आयुधपुरुष दाखविले तर त्यांत पुष्कळदा एक गदा देवी असते (ल.सं.42.189).
     या कालखंडात काही नवीन आयुधपुरुषांचाही उदय झालेला दिसतो. मनवा (उ.प्र.) येथून मिळालेल्या विश्वरूप विष्णूंच्या मूर्तीत चाप व शरपुरुष दिसतात (ल.सं.एच्. 124, चित्र ३४).

द्वारपाल :

     लक्ष्मी व गरुड यांच्या पाठीशीं देवाच्या पायाशीं किंवा वेगळे वैष्णव आयुर्धे घेतलेले द्वारपाल मध्यभारतीय कलेंत बऱ्याचदा दिसतात. द्वारपालांचे अंकन लक्षणग्रंथांस मान्य आहे.
   विद्याधर : मध्य भारतांत विद्याधरांचे अंकन बंगालसारखे कटाक्षानें होत नसे, पण त्यांना कधी नुसतेच तर कधी ढगांत उडतांना दाखवतात (ल.सं.४२.189, 55.286). विष्णूंच्या परिवार देवतांत क्वचित इंद्र, वरुण, यम, वगैरे दिग्पालही दिसतात.
६) अवतार - दहा अवतारांचे अंकन स्वतंत्र किंवा पाठशिळेवर अवतार मालिकेच्या रूपानें करीत (चित्र २५). संक्षेपात त्यांचा आढावा घेऊ.
मत्स्य - या अवताराचे अंकन साध्या माशाच्या रूपाने किंवा पाठींवर चार मानवमूर्ती किंवा मानवमस्तकें असलेल्या मत्स्याच्या रूपांत करतात. चार मानव म्हणजे मत्स्यानें वर आणलेल्या चार वेदांचे प्रतीक होय. कचित मत्स्याच्या पाठीवर शिवलिंग ही दिसते (रे.चि. एकोणतीस. ४९). मत्स्यावताराच्या स्वतंत्र प्रतिमा देखील असत. त्याचे प्रकार खालीलप्रमाणे आढळतात :
क) पद्मासनांत विष्णू, चरणशिळेवर मासा".
ख) कमललतेवर असलेला, पाठीवर चार मानव मुखें धारण करणारा मासा",
ग) शंख, चक्र, गदा व पद्म यांच्या भोवताल वेटोळ्या असलेल्या कल्पलतेवर मोठा मासा
कूर्म - यांचे तीन प्रकार दिसतात :
क) साधे कासव
ख) समुद्रमंथनांचे दृश्य, कासवाचे पाठीवर देव-दानव वेढलेला मंदराचल, बाजूला देव-दानव म्हणून देश पुरुष. क्वचित कासवाचे पाठीवर मंदराचला समोर पृथ्वी ही दिसते." या कूर्मप्रतीक दृश्याचा अपराजितमृच्छेत 'मंदरोन्मथन' असें म्हटले आहे. (रे. चित्र एकोणतीस ५०)
ग) वरीलसारखाच प्रकार, पण मंदाराऐवजी ब्रह्मसूत्र असलेले शिवलिंग दिसते. या परंपरेला विशिष्ट अवं होता कीं हे मूर्तिकाराच्या अज्ञानाने घेतलेले वळण होतें हे सांगतां येत नाही.
    वराह - यज्ञवराह, अर्थात् तोंडापासून शेवटीपर्यंत निरनिराळ्या देव प्रतिमांनी भरलेला पशुवराह, आणि नृवराज अशी याची दोन रूपें दिसतात. मध्यभारतात यज्ञ वराहाच्या बऱ्याच मूर्ती आढळतात. उदाहरणार्थ खजुराहों, ग्वाल्हेर आणि नागदा येथील वराह पहा. नृवराहाच्या पायाखाली लांब पसरलेला नाम, नागयुग्म, किंवा कुठें वैष्णव आयुर्धे आणि तोंडाखाली उभी पृथ्वी दिसते.
       नरसिंह - हिरण्यकशिपूचे पोट फाडणारा नरसिंह सामान्य आहे. हा चतुर्भुज, किंवा अष्टभुज (ल.सं.एच.१२५. चित्र २७) दिसतो. कधी हा हिरण्यकशिपूशी झगडतांना दिसतो (चित्र २८).
    वामन व त्रिविक्रम - येथे चतुर्भुज वामन, विष्णू व हातात छत्र घेतलेला द्विभुज बटू (रे.चि., सोळा १, अठा३) अशी दोन रूपें मिळतात. काही ठिकाणी यांचे मिश्रण असते. वामन-विष्णूंच्या वरच्या हातांत वैष्णव आयुधे असून वरद उजव्यात माळा आणि डाव्यात घट असतो. राजस्थानांत मिळणाऱ्या प्रकारांत काही ठिकाणीं उजव्या हातात माळा व कमळाची कळी असून वरच्या डाव्या हातांत छत्री व खालच्यांत पात्र असण्यांची शक्यता आहे. छत्र घेतलेला एक चतुर्भुज वामन-विष्णू मथुरेच्या संग्रहालयांतही आहे (मं.सं.सं. १०२५).
    दशावतार मालिकेत काही ठिकाणी पांचवा अवतार म्हणून त्रिविक्रम आढळतो. याच्या स्वतंत्र मूती हौ। इतरत्र मिळतात (उदा. अष्टभुज त्रिविक्रम, अलाहाबाद), पण त्यांत झाशीच्या काही प्रतिमा विशेष उल्लेखनीय आहेत. येथे तो शंख-चक्र गदा पद्म घेतलेला असून आलीढ मुद्रेत उभा आहे. अर्थात् त्याचा आओ जाणारा डावा पाय खाली आला आहे व त्याच्याबरोबरच ते राक्षसमुख किंवा ब्रह्मकपाल ही खालसे आलेले आहे, ज्यात तो शिरतांना दाखवितात (र.चि. अठरा राणीमहाल संग्रह सं. १२८). अशाप्रकारच्या मूर्तीत बळीचे दान दृश्य असते (रानी. सं. १२८) किंवा नसतेही (रानी. सं. १२९).
   परशुराम व राम - - या दोघांची ओळख क्रमानें त्याच्या हातांत असलेले परशु व धनुष्य बाण या उत्तरप्रदेशांत दशावतार मालिकेत हे दिसतात, पण मारवाडमधे मात्र द्विभुज रामाच्या मूर्ती कचित मिळतात. ओसिया येथील वैष्णव मंदिरांत ही राम दिसत नाही. स्वतंत्र मूर्तीचा विचार केल्यास खजुराहोत रामाच्या दोन मूर्ती आहेत, पैकीं एकींत तो ठिकाणी मात्र तो चतुर्भुज असून सीतेसह आलिंगन मुद्रेत उभा आहे. झाशीसंग्रहांत चतुर्भुज रामाच्या आयुधामुळे होते. धनुष्य बाण घेऊन उभा आहे. पण दुसऱ्या मूर्ती आहेत (चित्र २९) हााच्या साधारण हातात भला मोठा बाण आहे. एका उजव्याने तो मास्ती आशीर्वाद देत आहे व डाव्यानें सीतेचा स्तनस्पर्श करीत आहे. ओसिया, राजस्थान येथील अंबामा मंदिरात असलेली मूर्ती, आलिंगन मुद्रेत असलेल्या लक्ष्मी-नारायणांसारखी आहे. फक्त जल मारुतीच रामाची ओळख पटवून देत आहे. या काळात रामाची स्वतंत्र मंदिरे फारशी अस्तित्वात असावी असे वाटत नाही. रामकथेची दये
काही ठिकाणी आढळतात. मूर्तिशास्त्राच्या सिद्धांत ग्रंथात रामूर्तीचे बरेचसे प्रकार सांगितले आहेत. पण त्याप्रमाणं प्रतिमा सा तितक्याशा मिळत नाहीत.
बलराम व कृष्ण :
      मध्य भारतीय कलेत साधारणपणे आठवा अवतार म्हणून बलरामाला दाखवतात. कधी तो चतुर्भुज असून सर्पक नांगर, मुसळ, मद्याचा पेला, वगैरे सर्व चिह्नांनी युक्त असतो (ल.सं.४२.१८९) तर कधी तो मद्याचा पेला नांगर आहे मोजक्या चिह्नांसह दिसतो.

     बलरामाच्या स्वतंत्र प्रतिमाही काही ठिकाणी आहेत. वाराणसी जवळ कदर्मेश्वर येथील प्रतिहारकालीन मंदिराज उत्तरेच्या बाजूला बलराम रेवती दिसतात. लखनऊच्या संग्रहालयांत बलराम एकानंशा व कृष्ण यांची सुंदरमूर्ती आ (ल.सं.सं.जी ५८) राजस्थान मधे ही तो रेवतीच्या बरोबर किंवा मदिरावाहिकेच्या गळ्यांत हात टाकलेला, चतुर्भव रूपात गरुडावर बसलेला" अथवा गजलक्ष्मी बरोबर ही आढळतो. " मध्यप्रदेशात खजुराहो येथे तो रेवती किंवा कृष्णसर उभा दिसतो. एक ठिकाणी मात्र तो सूत लोमहर्षणांचा वध करतांना दाखविला आहे." गदा, शंख, पद्म व चक्र घेतलेले काळ्या पाषाणाची एक सुंदर अभिलिखित प्रतिमा दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयांत (सं.सं.एल्. ३९) आहे. लेखांत तिल 'संकर्षण' असें नांव दिले आहे.
     मध्यभारतीय कलेंत कृष्णलीलेची बरीच दृश्य दिसतात. त्यांत यशोदाकृष्ण, शकटासुरवध, कालियादयर गोवर्धनधारण, केशीवध, कुब्जेचा उद्धार, वगैरे दृश्ये खजुराहो, मंदोर, ओसिया (राजस्थान), गुजराथ, विमलवसां मंदिर, आबू, वगैरे ठिकाणी दिसतात." मात्र या प्रसंगानें दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षांत घेतल्या पाहिजेत. एक महा खजुराहो येथे कृष्णाला बऱ्याच ठिकाणी चतुर्भुज दाखविले आहे व दुसरे म्हणजे असे राधाकृष्ण, किंवा कृष्णाच्या उत्तर जीवनांचे अंकन फारसे दिसत नाही. कीं कृष्णांचे गोपींबरोबर चित्रण राधाकृष्ण किंवा कृष्णाच्या उत्तर जीवनाचे अंकन फारसे दिसत नाही.
 
 

बुध्द -

     दशावतार मालिकेत आहे पण ते पूर्वभारतांइतके नाही. कधी त्यांत घोडचुकाही आढळतात. उदाहरणार्थ उत्तरप्रदेशांतील एका प्रतिमेत पद्मासनांत बसलेला बुद्धाने दोन्हीं हात मांड्यांवर अभय मुद्रेत ठेवले आहेत (लं.स.ओ. २७५) बुद्धाच्या ब्राह्मण धमपि अशा स्वतंत्र मूर्ती नाहीत.

कल्की-

    हा दशावतार मालिकेत घोडेस्वाराच्या रूपांत दिसतो.

करिवरद :
    या अवतार अंकनाच्या निमित्तानें गजेंद्रमोक्षाची कथा दाखविण्याची पद्धत गुप्तकालापासून रूढ झाली होती. मध्यकालांतही चालू होती. अशा प्रकारच्या खजुराहो, वाराणसी, राणीमहाल संग्रह, झाशी, (चित्र ३१, रे.चि. एकवीस २.) वगैरे ठिकाणो आहेत.

हयग्रीव :

हयग्रीवाच्या मध्यकालीन प्रतिमा खजुराहो' व अटरु" (राजस्थान) येथून मिळाल्या आहेत.
मध्यभारतीय कलेतील विशिष्ट प्रतिमा :


    १) सूर्यनारायण : झालवाड (राजस्थान) येथील संग्रहालयांत असलेल्या या सहा हाताच्या स्थानक प्रतिमेत साधारण हातांत कमळे व इतर हातांत प्रदक्षिणाक्रमानें वर, गदा, चक्र व शंख अशी आयुर्धे आहेत. डोक्यावर सात फणांचा साप, पायांत जोडे व आजूबाजूला दंडपिंगल आहेत. वरच्या रथिकांत एक एक अजमुख पुरुष आसनस्थ असून त्याचा एक हात अभय मुर्देत आहे. दुसऱ्यांत घट आहे.


    २) योगमुद्रेत विष्णू किंवा योगनारायण: मथुरेच्या संग्रहालयांत पद्मासन घालून बसलेल्या विष्णूंच्या दोन प्रतिमा आहेत. (म.सं.डी. ३७; १४.३७९ चित्र ३२) त्यांत दोन्ही हात ध्यानमुद्रेत बेंबीखाली मांडीवर ठेवलेले आहेत व मागील हातांत गदा व चक्र ही आयुधं दिसतात. एकीच्या चरणशिळेवर शंख आहे. दोन्ही प्रतिमा फारच सुंदर असून प्रेक्षणीय आहेत.


    ३) मौनव्रतिन् - खजुराहोत" दिसणारा हा विष्णू पद्मासनांतच बसला आहे. मागील हातांत गदा व चक्र आहे, सामान्य उजवा खंडित आहे, पण डावा तोंडाजवळ आणून तर्जनी मुद्रेत असा ठेवलेला आहे. जणु की काय विष्णू या हातांने मौन राहण्यांबद्दल संकेत करीत आहे.

    ४) वैकुंठ - खजुराहोच्या लक्ष्मण मंदिरात असलेल्या यशोवर्मन यांच्या लेखांत वैकुंठ मूर्तीविषयी बरीच माहिती दिली आहे. या लेखांप्रमाणे 'भोटांच्या राजाला ही प्रतिमा मिळाली, त्याचेकडून कीर (कांगडा) देशाच्या शाही राजाने ती मिळविली. तिकडून ती हेरंबपालाकडे गेली व शेवटीं त्याच्या मुलांकडून म्हणजे देवपालाकडून चंदेल राजाला तिची प्राप्ती झाली.' याच शिळालेखांत वैकुंठाच्या उत्पत्तीची कथा दिली आहे. एकच शरीर धारण करून निवास करणाऱ्या तीन असुरांचा विष्णूनें सौम्य, नृसिंह, वराह व कपिल अशा संयुक्त स्वरूपाचा आश्रय घेऊन वध केला अशी ती कथा आहे. भागवतपुराण (८.५.४) व विष्णुपुराणांत (३.१.४१) शुभ्रऋषीची बायको विकुंठा हिचा मुलगा झाल्यामुळे विष्णूला वैकुंठ नांव मिळाले असे सांगितले आहे. या वर्णनाने वैकुंठ प्रतिमेवर प्रकाश पडत नाही, पण काश्मीरगम त्यावर चांगला प्रकाश टाकतात. वैकुंठाच्या प्रतिमा मथुरा (उ.प्र.), खजुराहो (मध्यप्रदेश)", राजस्थान, " व गुजरातमध्ये मिळतात. काश्मीरकडचा विचार पुढे करू. राजस्थानांत वैकुंठाच्या खालील प्रकारच्या विशेष प्रतिमा मिळतात.
    १) राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यांत बिजौला येथील महाकाल मंदिराच्या एका 'कूटा'वर असलेली षड्भुज मूर्ती हिचे डावे तोंड सिंहाचे, मधले घोड्याचे व उजवे वराहाचे आहे. घोड्याचे तोंड धारण करणारा अनिरूद्धही असू शकतो. श्री. रत्नचंद्र अग्रवाल यांनी महाभारताचा आधार घेऊन तसे असण्यांची शक्यता दाखविली आहे. महाभारतांप्रमाणें अश्वमुख अनिरूद्ध दंडकमंडलू घेऊन एकदा ब्रह्मदेवांपुढे उभा राहिला होता. 
   २) झालवाड संग्रहालयांतील गरुडारूढ अष्टभुज वैकुंठ. " याच्या हातांत कमळ, बाण, गदा, खड्ग, ढाल, चक्र, धनुष्य व शंख अशी आयुधे आहेत. आठ हाती प्रकार खजुराहोतही आहे. येथील वैकुंठाच्या चतुर्मुख प्रतिमेला सिंह, मानव, वराह व घोडा यांची तोंडे आहेत. जातां जातां राजस्थानांतील बिजौलिया येथील सिंह, घोडा व वराह यांची मुखें असलेल्या अष्टभुज देवी प्रतिमेंचाही उल्लेख करावयास हवा. डॉ. कल्पना देसाई यांनी जयाख्य संहितेचा आधार घेऊन तिला वैकुंठाची पत्नी म्हणून ओळखण्याचा प्रयत्न केला आहे.
३) विश्वरूप - वैकुंठाचे विकसित रूप म्हणजे विश्वरूपाचा एकप्रकार असे म्हणता येईल, कारण त्यांतही वराह व नृसिंहाची मुखे असतातच, पण त्याबरोबर इतरही व्याप बराच असतो. गुप्तकाळांत याचे षड्‌भुज व अष्टभुज असे दोन प्रकार रूढ होते. त्यांचा उल्लेख मागे झाला आहे.
     मध्यभारतांत पुढें विश्वरूपाचा नवा विकास झाला. आतां हात जरी आठच असले तरी तोंडे मात्र तीनच्या ऐवजी पांच दिसू लागली - डावीकडे मत्स्य आणि कूर्म व उजवीकडे सिंह तथा वराह. मुख्य मानवमुख, त्यावर हयग्रीव (?) व त्याच्यावर चतुर्मुख ब्रह्मदेव अशी ही रचना आहे (चित्र ३३). इतर देव म्हणजे दशावतार, अष्टभैरव, अकरारुद्र वगैरे प्रभावळीत दिसतात. दुसरे म्हणजे येथे चापपुरुष व शरपुरुष यांचा नवा उदय झालेला दिसतो. कन्नौज येथे मिळालेल्या प्रतिहार कालीन या सुंदर मूर्तीर्शी बरीच समानता असलेली मूर्ती पटना येथून ही मिळाली आहे. येथे कासवाऐवजी घोड्यांचे तोंड दिसते. या प्रतिमेची दुसरी वैशिष्ट्ये म्हणजे मुगुटांवर दिसणारा एक पक्षी व पायशिळेवरील पांच मासे हे होय. ग्वाल्हेर संग्रहालयांत असलेल्या पंचमुखी विश्वरूपाला दहा हात आहेत. खजुराहोत बाराहाती पंचमुखी विश्वरूप दिसतो. प्रसंगाने लखनऊ संग्रहालयांत असलेल्या मनवा (उ.प्र.) येथून मिळालेल्या विश्वरूपाचा उल्लेख करावयांस हवा. येथें चाप व शरपुरुषांबरोबरच कोपऱ्यांत हात जोडून बसलेला धनुर्धर अर्जुनही दिसतो (ल.सं.एच्. १२४ चित्र ३४). विश्वरूप प्रतिमेच्या काही प्रकारांचे वाङ्‌मयीन उल्लेख विष्णुधर्मोत्तरपुराण, अपराजितपृच्छा, रूपमंडन, वगैरे ग्रंथांत मिळतात.
४) लक्ष्मीनारायण - गुप्तोत्तर कालांत देवांची सशक्तिक प्रतिमा घडविण्यांची पद्धत रूढ झाली. उमामहेश्वरांप्रमाणेंच लोक लक्ष्मी नारायणांच्या आलिंगन-प्रतिमा देखील घडवू लागले (चित्र ३५). लक्ष्मी व नारायणाचे खालील प्रकार दृष्टीस पडतात.
• लक्ष्मी व नारायणाचा विवाह. दुसरी विवाह प्रतिमा वाराणसीच्या सिद्धिविनायक मंदिरात आहे.\
 लक्ष्मीचा स्तनस्पर्श, स्थानकप्रतिमा.
लक्ष्मीनारायणांच्या आसन मूर्ती (चित्र ३५)
- गरुडाचे पाठीवर लक्ष्मीनारायण (ल.सं. बी. ७१ चित्र ३६).

५) त्रैलोक्य मोहन किंवा गरुडारूढ नारायण - गरुडाचे खांद्यावर मांडी घालून बसलेला विष्णू, खजुराहो येथे याला आठ हात दिसतात या प्रकारचा उल्लेख भागवत आढळतो तेथे याला त्रैलोक्यमोहन' असे म्हटले आहे. अपराजितपृच्छेप्रमाणे गरुडावर बसलेल्या त्रैलोक्यमोहनाला सोळा हात व वराह सिंहादि चार तोंडे हवीत.
  उरलेली दोन आयुधं म्हणजे गदा व कमळ ही नेहमी हवीतच असा दंडक नव्हता. श्रीनिवास प्रतिमेत गदा असतच नाही. इकडील गदेचा आकार फुगीर व लंबगोल असा असतो. कमळसुद्धा उत्तरे सारखे सामान्य नाही. श्रीनिवासन् यांच्या मते ते पल्लव काळाच्या व त्यानंतर पुढे दहाव्या शतकांतील धातुमूर्तीच्या सामान्य उजव्या हातांत दिसते, पण श्री शिवराममूर्ती एकूण त्याला दुर्लभच मानतात. त्यांच्या मतें जेव्हा ते क्वचित दिसते तेव्हा ही त्याचे रूप म्हणजे उघड्या तळहातांवर शोभणाऱ्या चिमुकल्या फुलांचे असते.
७) आयुधांबरोबरच आयुधपुरुषांकडेही दृष्टिक्षेप करावयास हवा सुरुवातीच्या काही प्रतिमांत आयुधपुरुष दिसतात, पण पुढे मात्र ते दुर्मिळ होतात. कचित त्याच्या स्वतंत्र मूर्ती दृष्टीस पडतात. अशाच प्रकारच्या एका मूर्तीत गदेला नेहमीप्रमाणे स्त्री रूपांत न दाखवता पुरुष रूपांत अंकित केले आहे.
८) सामान्यपणें उत्तरेपेक्षा दक्षिणेंत शेषशायी प्रकार सोडला तर परिवार देवतांचा घोळका कमी असतो व असला तर निराळ्या प्रकारचा असतो. शेषशायी प्रतिमा मात्र परिवारदेवतासह अर्थात् 'बहुबेर विधानातेंच' करावी असा नारदीय संहितेचा स्पष्ट संकेत आहे. या ग्रंथांत विष्णूच्या परिवार देवतांत श्री व भूदेवी, आयुधे दिक्पाल, द्वारपाल, गणेश, दुर्गा, वगैरेचा उल्लेख आहे. पण सर्वत्र यांचे दर्शन घडतेच असें नाही.
९) जातां जातां विष्णूच्या श्रीवत्सासंबंधीही विचार करावयास हवा. श्रीवत्स हे श्री किंवा लक्ष्मीचें प्रतीक असून तशा प्रकारची एक पल्लव काळातील स्वतंत्र धातुप्रतिमा एणाडि (तंजावर) येथून मिळाली असल्याचा उल्लेख श्री. शिवराममूर्ति करतात. सामान्यतः सुरुवातीच्या पल्लव विष्णूंत हे दिसत नाही, पण पुढे उत्तर पल्लव, चोळ, विजयनगर, वगैरे काळांत हे बऱ्याचदा आढळतें. याचा आकार एका लहानग्या त्रिकोणाचा असून स्थान विष्णूच्या वक्षस्थलाचा उजवा भाग हे होय. 

विष्णूची रूपें व विशिष्ट प्रतिमा :

श्रीनिवास - डावा हात कमरेवर ठेवून मागील हातांत चक्र, शंख घेतल्या विष्णूला श्रीनिवास, व्यंकटेश किंवा बालाजी म्हणून ओळखतात. श्रीनिवासाची पूजा तिरुपतीकडे जास्त आहे. त्याचा कट्यवलंबी डावा हात हे सुचवतो की भक्तांकरिता भवसमुद्र कमरे इतकाच खोल आहे.




लक्ष्मीनारायण - हे दोन रूपात दिसतात. एकतर सिंहासनांवर आलिंगनमुद्रेत बसलेले' व दुसरे म्हणजे गरुडाच्या पाठीवर आरुढ असणारे गरुडारूढ विष्णू कधी चतुर्भुज असतो तर कधी अष्टभुज. बेंगलूर येथील संग्रहालयांत असलेल्या अष्टभुज विष्णूंच्या हातांत अभय मुद्रा, पाश, खड्ग, बाण व डावीकडे शंख, आलिंगन मुद्रा, धनुष्य, वगैरे दिसतात. कमळ घेतलेली लक्ष्मी द्विभुज आहे. (चित्र ३८) कमरेखाली पक्षिरूपांत असलेल्या गरुडाने आपल्या दोन हातांत अमृत कुंभ घेतला आहे व मागील दोन हाताने तो विष्णूच्या पायांना आधार देत आहे.
विष्णूची द्वादश रूपें - विष्णूच्या बारा व चोवीस रूपांची चर्चा मागे झालीच आहे. तिरुची जिल्ह्यांतील नर्त्तमलाइ नांवाच्या एका गुफामंदिरांत सुमारे दोन मीटर उंच विष्णूंच्या बारा प्रतिमा त्याच्या बारा रूपांना दाखवितात. या सर्व सुमारें सन् १११५ च्या आहेत.
हरिहर - विष्णू व शिवाच्या संयुक्त प्रतिमा दक्षिणेत ही माहित होत्या. चोळ कालीन अशा एका चतुर्भुज प्रतिमेत शिव-विष्णूचे अंकन करण्यांकरितां मागच्या हातांत परशु व शंख अशी आयुधे दिली आहेत.

शेषशायी - दक्षिणेंत हा प्रकार फारच लोकप्रिय होता. इकडे दोन किंवा चार हाती, तसेच सायुध व निरायुध असे प्रकार मिळतात. एवढेच काय शयनाभिचारिक पद्धतीची दोन हाती उताणी निजलेली विष्णुप्रतिमा देखील दक्षिण रतीय कलेला नवी नव्हती.  विष्णूच्या योगशयन मूर्तीस रंगनाथ असेही म्हणतात.
 
अवतार मूर्ती - विष्णूच्या दहा अवतारांत साधारणपणें वराहापासून सुरुवात होते.

वराह - राष्ट्रकूटांचे 'वराह' हे राजचिह्नच होते. उत्तर व दक्षिणेंतील वराहांत सर्वात मोठा फरक म्हणजें पृथ्वीची मुर्ती हा होय. दक्षिणेंत बऱ्याच ठिकाणी पृथ्वी वराहाच्या डाव्या हातांवर उभी दाखवतात. कोठे तो तिला कडेवर ल्याप्रमाणे दोन्ही हातांत धरून उभा असतो, तर कोठे ती त्याच्या डाव्या भुजेवर बसलेली दिसते.  या शिवाय प्रमीला अंकावर घेऊन उभा किंवा बसलेला वराह देखील लोकप्रिय होता. पृथ्वीला धारण करणारा नृवराह व क्ष्मीसह असलेला भूवराह या नांवाने ओळखला जात असे. वैखानसागमांप्रमाणें लक्ष्मीसह सिंहासनावर बसलेल्या हाला यज्ञवराह, त्याच्या बरोबर पृथ्वी असल्यास प्रलय वराह असें म्हणत.  उत्तरेंत दिसणाऱ्या आंगभर देवमूर्ती मलेल्या पशु आकृती वराहाची प्रतिमा दक्षिणेंत असल्याचे ऐकिवांत नाही.

नरसिंह - नरसिंह हे दक्षिणेतील एक लोकप्रिय दैवत आहे. याच्या चार, सहा व आठ हाती अशा बऱ्याच मारच्या मूर्ती मिळतात.  लक्षण ग्रंथांत दोन व सोळा हाती नरसिंहाचे उल्लेख आहेत. आगमग्रंथांप्रमाणें नरसिंहचे गिरिज, स्थौण, केवल, यानक, वगैरे प्रकार आहेत. गिरिज हा पर्वतातील सिंह आहे, तो बहुतेक एकटा असतो. इल नरसिंह नांवाप्रमाणें एकटाच दिसतो.  पण स्थौण नरसिंह मात्र खांबातून प्रगट झालेला असून त्याला हिरण्यकशिपूंशी करताना दाखवितांत.  अशा प्रकारच्या बऱ्याच प्रतिमा दक्षिणेत व उत्तरेतही आढळतात. लक्ष्मी बरोबर आसनांवर लेला लक्ष्मीनरसिंह (चित्र ३९), योगपट्ट बांधून बसलेला योगनरसिंह" व गरुडाचे पाठीवर बसलेला यानक सिंह" म्हणून ओळखला जातो.
त्रिविक्रम - दक्षिणेंतील प्रत्यक्ष मूर्तीत वामन-विष्णू किंवा बटु-वामन असे प्रकार आढळत नाहीत पण त्रिविक्रममूर्ती पल्लव काळापासूनच मिळतात. येथे 'देव' अष्टभुज असून त्याच्या हातांत धनुष्य, ढाल, शंख, खड्ग, गदा, चक्र, रि आयुधे आहेत. प्रदक्षिणा करणारा जांबवान, आकाशांतील सूर्य, चंद्र वगैरेचे अंकन येथे केलेले आहे. याशिवाय क्षणेत चतुर्भुज त्रिविक्रमाच्या देखील प्रतिमा घडवीत असत" अशा प्रकारच्या एका प्रतिमेंत त्रिविक्रमाच्या उचललेल्या याचे प्रक्षालन करणारा ब्रह्मदेव व तेथून प्रगट झालेली गंगा स्पष्टपणें अंकित केली आहे.

परशुराम, राम - लक्षणग्रंथांत परशुराम किंवा भार्गवरामाच्या मूर्तीचा उल्लेख असला तरी त्याच्या स्वतंत्र प्रतिमा रशा आढळत नाहींत. दाशरथी रामाच्या पाषाणां पेक्षा धातुमूर्ती बऱ्याच मिळतात. बहुतेक तो द्विभुज व धनुष्य ण घेतलेला असून त्यांचे बरोबर लक्ष्मण, सीता व आंजनेय किंवा मारुती यांस अंकित करतात. कधीतर तो चतुर्भुज सून बाण, चक्र, शंख व धनुष्य घेतलेला असतो (चित्र ४०). आंध्र प्रदेशांत या चौघासह बसव किंवा नंदीची गणना रून या पंचायतनाला 'पंचलोह' म्हणतात.
दक्षिण भारतीय कलेत वेरुळ येथे सीता हरण, वालि-सुग्रीव युद्ध, वालि-वध, वगैरे रामायण कथेची दृश्ये कोरलेली गहेत. त्याचप्रमाणें तूर्त हैदराबादच्या राजकीय संग्रहालयांत असलेल्या पण मुळांत नालगुंडा येथून मिळालेल्या स्तंभावर विण-जटायु युद्ध, रामराज्याभिषेक, सुवर्णमृत, वगैरे कथादृश्यें अंकित आहेत.

 
कृष्ण - उत्तरेप्रमाणेंच दक्षिणेंत ही कृष्णाच्या बालरूपाची उपासना जास्त लोक प्रसिद्ध होती. येथे या रूपांत कृष्णाचे यशोदा कृष्ण, नाचता बालकृष्ण, नवनीतनट, कालीय-कृष्ण, गोवर्धनधर, वेणुगोपाल" अशी बरीच 'कौमार' रूपे मिळतात. कृष्णांचे गोदोहन महाबलीपुरम् येथें बऱ्याच मोठ्या प्रमाणांत कोरलेले आहे, किंबहुना तेथे या मण्डपांस कृष्णमंडप असेच नांव दिले आहे. कृष्णांच्या पुढच्या आयुष्यांतील कृष्ण-रुक्मिणी-सत्यभामा अशा एका रूपाचा उल्लेख शिवराममूर्ति यांनी केला आहे. कृष्ण-रुक्मिणीची पाषाण प्रतिमा मद्रास संग्रहालयांत आहे.
कृष्णांच्या द्विभुज व चतुर्भुज रूपाची चर्चा आपण मागे केलेली आहे. दक्षिणेतही काही रूपांत दोन्ही प्रकार आढळतात. प्रथम म्हणजे वेणुगोपल किंवा मुरलीधर कृष्ण***, बेलूर व हलेबीड येथे त्याचे द्विभुज रूप दिसतें (चित्र ४१) तर पाषाण व धातुमूर्तीत बऱ्याचदा तो चार हातांचा चक्र, शंख घेतलेला आढळतो, तेनाक्षीचा मदनगोपाल तर आठ हातांचा मुरलीधर आहे. बहुभुज प्रकारचे दुसरे रूप म्हणजे गोवर्धनधारी कृष्णांचे होय. त्यांचे द्विभुजरूप हलेबीड येथे दिसतें तर बंगलोर संग्रहालयांतील काळ्या पाषाणाच्या अष्टभुज गोवर्धनधारीच्या प्रतिमेचा उल्लेख आपण मागेच केलेला आहे. त्रिरथ पीठावर असलेल्या ह्या सुंदर प्रतिमेच्या आजुबाजूस काठ्या घेतलेल्या व नृत्य करणाऱ्या अशा चार गोपी व पाय शिळेवर सवत्स धेनू आहेत. हातांवर असलेल्या गोवर्धनांवर मोर, वगैरे पक्षी तसेंच सिंह, हरणें, वगैरे जीवजंतू आहेत.

कृष्ण आणि पुतना

 
 शिल्प - कृष्ण आणि पुतना, बिजा मण्डल, मध्य प्रदेश ( ९ वे शतक)
   कृष्ण हे भारतीय धार्मिक परंपरेमध्ये असलेले असे चरित्र आहे ज्याने सर्वांना त्याच्या कथांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळकृष्ण, यशोदेला प्रश्न विचारून भंडावून सोडणारा कृष्ण, गोपिकांबरोबर खेळणारा कान्हा, कंस वध करणारा जबाबदार तरुण कृष्ण आणि महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन आयुष्याचे आणि या सृष्टीचे तत्वज्ञान गीतेत संगणारा, विश्र्वरूप दर्शन देणारा भगवान श्रीकृष्ण. अशा अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या कलांमध्ये देखील कृष्णाची ही रूपं आपल्याला बघायला मिळतात. कृष्ण चरित्रतला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने बाळ असताना केलेला अनेक असुरांचा वध.
     पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
    मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्रीने बाळाला स्तनपान देताना देखील आपले दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.
  एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे आहे.

हयग्रीव - बुद्ध व कल्की यांच्या स्वतंत्र अशा अवतार प्रतिमा नाहीत पण हयग्रीवाच्या मात्र धातू व पाषाण मूर्ती आढळतात.*** काही धातुमूर्तीत तो मांडी घालून बसलेला असून त्याच्या मागच्या हातांत वेदाची पोथी आहे व उजवा सिंहकर्णमुर्देत आहे. नुग्गेहळ्ळी येथे अष्टभुज हयग्रीवाची आलीढ मुडेंत उभी असलेली पाषाण प्रतिमा आहे. त्याच्या हातांत गदा, बाण, चक्र, खड्ग, शंख, खेटक, धनू आणि पद्म अशी आयुधे आहेत.
वरदराज किंवा करिवरद या अवताराची चर्चा मागें आली आहेच. गजेंद्राचा उद्धार करणारा गरुडारूढ चतुर्भुज किंवा अष्टभुज वरदराज दक्षिणेंत ही बराच दिसतो.



पांडुरंग - महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दैवत म्हणजें पंढरपुरचा विठ्ठल किंवा पांडुरंग हे होय. मातापित्याची सेवा करणाऱ्या पुंडलीक नांवाच्या ब्राह्मणांवर प्रसन्न होऊन कृष्णानेच पांडुरंगाचे रूप घेतले अशी कथा आहे. हा द्विभुज असून विटेवर समपद स्थितीत उभा आहे. त्याच्या एका हातांत शंख असून दोन्ही हाथ कमरेवर ठेवलेले असतात (चित्र ४२). परंपरेप्रमाणें त्याचे डोक्यावर शिवलिंग व मानेवर गवळीपणांचे द्योतक म्हणून शिंकें असते. पांडुरंगाच्या धातू व पाषाणाच्या मूर्ती बऱ्याच मोठ्या संख्येत आढळतात. काही परंपरा दशावतारांत बुद्धाचे ऐवजी पांडुरंगाची गणना करतात.

 
श्रीकर विष्णू - त्रिवेन्द्रम येथील पद्मनाभस्वामीच्या मंदिरांत कुलशेखर मंडपांच्या एका खांबावर महत्त्वाचे विष्णुशिल्प आहे. कमळावर उभ्या विष्णूच्या वर उचललेल्या उजव्या हातांत चक्र आणि डाव्यात शंख आहें. खालील हातांच्या पसरलेल्या तळव्यावर पद्मासनांत बसलेली द्विभुज देवी आहे. तिच्या हातांत पात्र आहे. ही मूर्ती जरी सुमारे अठराव्या शतकांतील असली तरी मनोवेधक आहे, कारण केरल देशीय श्रीकुमाराच्या शिल्परत्नांत थोड्या फरकानें हे ध्यान आढळतें. 

नरसिंह

 विष्णू या देवतेची अनेक वेगवेगळी रूपं आहेत. हतांमधल्या आयुधांचा जो क्रम आहे त्यावरून तयार होणाऱ्या चोवीस वेगवेगळ्या मूर्ती, विष्णूचे अवतार, संयुक्त आणि संकीर्ण मूर्ती असे अनेक प्रकार आहेत. यापैकी सर्वात जास्त प्रसिद्ध असणाऱ्या म्हणजे विष्णूच्या अवतार मूर्ती. पुराणांमधून या संदर्भातल्या अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतात. आज आपण विष्णूच्या नरसिंह या अवताराची माहिती घेणार आहोत. योग, शांत, उग्र, लक्ष्मी सह अशा अनेक प्रकारांमध्ये नरसिंहअवतार शिल्पं बघायला मिळतात. 
   हिरण्यकश्यपू नावाच्या असुर राजाला वरदान मिळाले की त्याला घराच्या आत किंवा बाहेर मृत्यू येणार नाही, देव मारू शकत नाही किंवा दानव, हत्यार, मनुष्य, जनावर या कशानेही मृत्यू येणार नाही, तो सकाळी मारणार नाही किंवा रात्री. एवढे ताकदवान वरदान मिळाल्यावर त्याने तीनही लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरवत आपला दरारा वाढवला. देवांनी विष्णूकडे याचना केली की यातून आम्हाला वाचव. इथे गीतेमध्ये सांगितलेला श्लोक आपल्याला आठवतो - जेंव्हा जेंव्हा या सृष्टीमध्ये अन्याय होईल, त्या त्या वेळेला धर्मसंस्था परत मार्गावर आणण्यासाठी मी येईन. 
   परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्|
     धर्मसंस्था परार्थाय सम्भवामि युगे युगे||
     यानंतर विष्णूने नरसिंह म्हणजेच ना देव ना दानव, ना मनुष्य ना प्राणी असे रूप घेऊन, घराच्या उबऱ्यावर संध्याकाळी हिरण्यकश्यपू असुराचा वध केला. त्याला मांडीवर घेऊन पोट फाडणारा नरसिंह तुम्ही सर्वांनी बघित ला असेल, पण हे युद्ध एवढं सोप्पं होतं का? नाही! 
  दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले, त्यात शेवटी जेंव्हा नरसिंहाने त्याला पकडले आणि आता तो त्याला मांडिरवर घेणार बरोबर हाच क्षण कलाकाराने या शिल्पामध्ये पकडला आहे. 
     कर्नाटकात पटदक्कल नावाच्या प्राचीन वारसा स्थळामध्ये असलेल्या मंदिरावर हे शिल्पं आहे. डावीकडून हे शिल्प बघायला सुरू करूयात. हिरण्यकश्पूच्या हातामध्ये पकडलेली तलवार, त्यामधून नरसिंहाने हात मध्ये घालून त्याला पकडले आहे, मागच्या भिंतीवर जुना रंग कसा असावा याच्या छटा दिसतात, नरसिंहाची आयाळ, मुकुट, मोठे डोळे आणि उघडलेला जबडा यातून दिसते ती जरब आणि राग, हिरण्यकश्यपूचे दोन्ही खांदे नरसिंहाने पकडले आहेत, त्याच्या बोटांची नखे देखील कलाकाराने कोरलेली आहेत. आणि या शिल्पामध्ये बघायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरण्यकश्यूच्या चेहऱ्यावर कलाकाराने कोरलेली मूर्तिमंत भिती! 
  आपल्याकडे मंदिरांवर असलेला दगड देखील भावनेने ओतप्रोत भरलेला आहे. तो लाजतो, हसतो, चिडतो, रागावतो फक्त आपल्याला बघता आलं पाहिजे! 
शिल्प - नरसिंह
 पटदक्कल (जागतिक वारसा स्थळ - World Heritage site)
विरूपाक्ष मंदिर - आठवे शतक

उग्र नरसिंह

     हळेबीडू येथील होयसळेश्वर मंदिरावर बाह्य भागात उग्र नरसिंहाची आसनस्थ मुर्ती दिसते. नरसिंहाची हिरण्यकश्यपुचे पोट फाडतानाची मुद्रा सर्वत्र आढळते. पण या ठिकाणी हिरण्यकश्यपुच्या पोटातील आतडे बाहेर काढून त्याची कलात्मक नक्षी दाखवली आहे ती पाहून आपण चकित होतो. या आतड्याची लांबी त्या आकाराच्या माणसाच्या आतड्या इतकीच शिल्पात दाखवली आहे.  ८०० वर्षांपूर्वी एका शिल्पकाराला मानवी शरिरशास्त्राची पोटातील अवयवांसह पूर्ण माहिती होती आणि ती तो कलात्मक पातळीवर दाखवून देवू शकत होता हे थक्क करणारे आहे. ही आतड्याची माळ डाव्या बाजूची पूर्ण आहे. उजव्या बाजूला तुटलेली दिसते आहे.
    हा नरसिंह आठ हातांचा आहे. चार हातात विष्णुची आयुधं (शंख चक्र गदा इ. दिसत आहेत) दोन हातांनी हिरण्यकश्यपुचा पाय आणि डोके पकडले आहे. आणि बाकी दोन हातांनी नखाच्या सहाय्याने पोट फाडलेले दिसत आहे.
        वरील मुर्ती उग्र नरसिंह अथवा विदारण नरसिंह म्हणून ओळखली जाते. नरसिंहाच्या अजून दोन मुर्ती प्रचलीत आहेत. योगमुद्रेतील शांत सौम्य मुर्तीला योग नरसिंह म्हणतात. तिसरी मुर्ती लक्ष्मी बरोबरची तिला लक्ष्मी नरसिंह किंवा भोग नरसिंह असे म्हणतात,
नरसिंहाची जी प्राचीन मंदिरे आहेत त्यात गोदावरी काठी नांदेड जिल्ह्यात राहेर येथे आहे (बाकी बहूतांश मंदिरे तुलनेने अलीकडच्या काळातील आहेत). नांदेड परभणी परिसरात या तीन प्रकारच्या नरसिंहाला बोली भाषेत आग्या नरसिंह, योग्या नरसिंह आणि भोग्या नरसिंह अशी नेमकी अनुप्रास जुळणारी नावे आहेत. प्रत्यक्ष मंदिरं कमी असली तरी बहूतांश विष्णु मंदिरांवर उग्र नरसिंहाचे शिल्प बाह्य भागात, देवकोष्टकात आढळून येते.
योग नरसिंह :-
    औंढा नागनाथ जवळ राजापुर इथे ज्या तीन मुर्ती आहेत त्यातील ही दूसरी मुर्ती योग नरसिंहाची आहे. अर्ध सिद्धासनातील हा नरसिंह असून चेहरा सौम्य आहे. योग नरसिंह मुर्तीला योगपट्टा असतो. तो इथे दिसत नाही. हंपी येथील प्रसिद्ध जी मुर्ती आहे तिला योगपट्टा स्पष्ट आणि मोठा दिसून येतो. ही मुर्ती साडेतीन फुटाची आहे.
      अर्ध सिद्धासनातील नृसिंह मुर्ती फारच थोड्या आहेत. हा नरसिंह दोनच हातांचा आहे त्यामुळे पण याचे वेगळेपण दिसून येते (पैठण येथे १४ हातांची विदारण नृसिंह मुर्ती आहे). राजापुर येथील तिन्ही मुर्ती त्यांच्या विलक्षण शिल्पसौंदर्याने अभ्यासकांना चकित करतात. या मुर्तींचा कालखंड १३ व्या शतकापर्यंत मागे जातो. विष्णुच्या याच अवतारातील मंदिरे ११ व्या ते १४ व्या शतकात जास्त आढळून आली आहेत. बाकी विष्णु अवताराची मंदिरे जवळपास नाहीतच. (फोटो सौजन्य हरिहर भोपी, औंढा)

१४ हातांचा विदारण नरसिंह :-

नरसिंह रूपातील विविध मुर्ती प्रचलीत आहेत. त्यातील विदारण्य म्हणजेच उग्र नरसिंह मुर्तीला चार, सहा, आठ हात दाखवले जातात. पण पैठण येथील ही मुर्ती सगळ्यांत वेगळी यासाठी आहे की तिला सगळ्यात जास्त म्हणजे १४ हात दाखवले आहेत. उजव्या बाजूला खङग, अंकुश, पद्म, बाण, चक्र दिसून येतात. तर डाव्या बाजूला खेटक (ढाल), फासा, गदा, खङग, शंख दिसून येतात. दोन हात हिरण्यकश्यपुचा पाय आणि डोकं धरून ठेवत आहेत. तर दोन हात त्याचे पोट फाडत आहेत.

ज्या आसनात नरसिंह बसलेला आहे त्याला वामललितासन म्हणतात. (उजवा पाय वर घेतलेला, डावा पाय जमिनीवर)
या मुर्तीकारापुढे आवाहन होते ते १४ हातांचा तोल राखत मुर्ती प्रमाणबद्ध ठेवणे. शिवाय विविध आयुधे स्पष्टपणे शिल्पांकीत करणे. चार फुटाच्या या मुर्तीत ही किमया कलात्मक रित्या साधल्या गेली आहे. हिरण्य कश्यपुच्या हातातही शस्त्र आहेत. तोही राजा असल्याने त्याला मुकुट दाखवला आहे. नरसिंहाची आयाळही दागिन्या सारखी गळ्याभोवती शोभून दिसते आहे. कलात्मक दृष्ट्या या मुर्तीचे मोल खुप मोठे आहे.
 डाॅ. गो.ब. देगलूरकरांनी या मुर्तीचे सविस्तर सुरेख विश्लेषण आपल्या पुस्तकात केले आहे)

हम्पी येथील भव्य योग नरसिंह :-

     हम्पी या पुरातन राजधानीची खुण दाखवणार्‍या दोन मुख्य गोष्टी आहेत. एक आहे विजय विठ्ठल मंदिर आणि दूसरी आहे ही अति भव्य नरसिंह मुर्ती. नॅशनल बुक ट्रस्टनी विजय नगरवर जे पुस्तक प्रकाशीत केलं त्याच्या मुखपृष्ठावर हाच नरसिंह आहे.
विजयनगर साम्राज्यातील या दोन्ही देवता महाराष्ट्रासाठी आस्थेचा विषय आहेत.
         या नरसिंह मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची भव्यता. प्रत्यक्ष मुर्ती इतकी भव्य तर ते मंदिर केवढे असेल? एकसंध दगडात मुर्ती सोबतच मागचा भव्य शेषही कोरलेला आहे. खालच्या आसना सगट या मुर्तीची उंची २५ फुट इतकी आहे. योग मुद्रेतील या नरसिंहाच्या पायात योगपट्टा आहे. याच्या डाव्या मांडीवर लक्ष्मीचीही अतिशय देखणी मुर्ती होती. पण ती आता नाही. मुर्तीचे हातही खंडित झाले आहेत. शेषशायी विष्णुच्या माथ्यावर जसा ७ फण्याचा नाग असतो तो तसा इथेही दिसतो आहे. माथ्यावरचा मुकूट विजयनगर साम्राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारा आहे. नरसिंहाची ही सगळ्यात भव्य अशी मुर्ती समजली जाते.
      याचं एक अतिशय वेगळेपण म्हणजे समोर उभं राहून चेहर्‍याकडे आपण बघत राहिलो तर हळु हळु इतर सर्व गोष्टी दिसेनाश्या होतात. हे उग्र सिंहमुख किंचित हसून आपल्याकडे मायाळुपणे पाहते आहे असा भास होतो. दूष्ट शक्तींचा नाश करणारा मी सज्जनांच्या पाठिशी आहे आहे असा विश्वास हा नरसिंह आपल्याला देतो. मुर्तीकडे पाठ फिरवून आपण परतत असताना एकदा तरी मागे वळून पाहण्याचा मोह होतोच. मागे वळल्यावर मुर्ती परत आपल्याला बोलावते आहे असे जाणवते.
सध्या मुर्ती भोवतीची जी दगडी रचना आहे ती बाजूला करून मुर्ती खुली केल्यास तिची भव्यता अजून जाणवेल. या मूर्ती शेजारी उग्र नरसिंहाचे शिल्प कोरलेले आहे. डाव्या बाजूला वीणावादिनी सरस्वतीचे शिल्प आहे.वरतून कोसळणार्‍या धबधब्याच्या पाण्यातूनच लेणीत जाता येते. पावसाळा उताराला लागतो तेंव्हा ही धार बारीक होवून जाते. उन्हाळ्यात मग धबधबा पूर्णच कोरडा पडतो. तरी समोरच्या कुंडात थोडे पाणी साठलेले असते.

भोग नरसिंह आणि योग नरसिंह :-

डावीकडची साधी सुबक मूर्ती आहे भोग नरसिंहाची. यालाच लक्ष्मी नरसिंह असेही म्हणतात. डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मागे ९ फण्यांचा नाग आहे. मूर्तीला फार विशेष अलंकरण असं काही केलेलं नाही. ही मूर्ती बोरकीनी नावाच्या सेलू तालूक्यातील देवगाव फाट्या जवळील छोट्या गावातील आहे. प्राचीन जूनं मंदिर आता आधुनिक करण्यात आलं आहे. मंदिरा जवळ पडझड झालेली प्राचीन बारव आहे. या बारवेची दूरूस्ती डागडूजी होण्याची अत्यंत गरज आहे.
उजवीकडची मूर्ती योग नरसिंहाची आहे. ही मूर्ती आधीच्या मूर्तीपेक्षा प्राचीन आहे हे सहजच लक्षात येते. ही मूर्ती नांदेड जवळच असलेल्या शंखतीर्थ येथील मंदिरातील आहे. नरसिंहाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. योग मूद्रेतील दोन हात आहेत त्यातील उजव्या हातात अक्षमाला आहे. पायात योगपट्टा आहे. मागे प्रभावळ असून त्यावर दशावतार कोरलेले आहेत. या मंदिराचा अतिशय चांगल्या पद्धतीनं जिर्णोद्धार झाला आहे.
शंखतीर्थ गोदावरी नदीच्या काठावर आहे. या जागेला गोदावरीचे नाभीस्थान समजले जाते. तसा गौरवपूर्ण उल्लेख दासगणु महाराजांनी आपल्या गोदा महात्म्यात केला आहे. नरसिंह मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंदिरे नेहमीच पाण्याच्या जवळ बांधली जातात. नदी नसेल तर किमान सुंदर बारव तरी मंदिरा जवळ असतेच.
ही दोन्ही मंदिरं जिर्णोद्धाराचे दोन नमुने आहेत. बोरकिनी येथे आधुनिक सिमेंटीकरणाच्या नादाला लागुन प्राचीनत्व नष्ट केल्या गेलं तर शंखतीर्थ येथे काळजीपूर्वक जिर्णोद्धार झाला जेणेकरून मंदिराचे प्राचीनत्व बर्याच प्रमाणात राखले गेले.
(फोटो सौजन्य भोग नरसिंह- मल्हारीकांत देशमुख परभणी, योग नरसिंह- डाॅ. नंदकुमार मुलमुले नांदेड)

.भग्न मंदिरावरील उग्र नरसिंह :-

   होट्टल (ता. देगलूर जि. नांदेड) येथील जिर्णावस्थेतील सोमेश्वर महादेव मंदिरावरील हे अप्रतिम शिल्प. हा आहे उग्र नरसिंह. मांडीवरील हिरण्यकश्यपुचे पोट फाडणारे दोन हात आणि शंख चक्र धारण करणारे दोन हात असे चार हात ओळखता येतात. बाकी शिल्पावर दशावतार कोरलेले दिसत नाही. डोक्यामागे नागफणा आहे. नरसिंहाचा मुकुट स्पष्टपणे दिसतो. मंदिराच्या बाह्य भागावर मुख्य देवकोष्टकांतील जशी सूर्य नारायणाची आहे तशी ही मूर्ती असावी. .
मंदिराची अवस्था पाहून याची दूरूस्ती करण्यास असमर्थ ठरलेली सरकारी यंत्रणा आणि सरकारवर दबाव टाकू शकणारे आपण या सगळ्यांच्याच नालायक वृत्तीचे पोट या नरसिंहाने फाडावे असे फार तीव्रतेने वाटते.
   या मंदिरासाठी चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने ११०१ मध्ये देणगी दिल्याचा शिलालेख याच मंदिरापाशी सापडलेला आहे. मंदिराचा कालखंड अकराव्या शतकाच्या शेवटचा असल्याचे यातून निष्पन्न होते.

नृसिंह मुर्ती, मेहकर, बुलढाणा

जगामध्ये पौराणिक ११ नृसिंह आहेत. त्यापैकी ६ वे नृसिंह मंदिर मेहकर (जि. बुलडाणा) येथे आहे. गीतेच्या अकराव्या अध्यायाच्या महात्म्यात या मेहकरच्या नृसिंहाचा उल्लेख आहे, एवढे हे स्थान प्राचीन आहे. म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे.
    विष्णूच्या दशावतारापैकी ज्या अवताराची पूजा होते, असा नृसिंह हा पहिला अवतार आहे. मेहकरची ही नृसिंहमूर्ती खूप सुबक आणि रेखीव आहे.    
पाकिस्तानातील मुलतान येथे अवतार घेतल्यानंतर भगवान नरसिंहाने मेहकर येथे भक्त प्रल्हादाने दिलेले भोजन ग्रहण केले होते, अशी आख्यायिका आहे. अयोध्येहून लंकेकडे जाताना प्रभू रामचंद्रांनी मेहकरचा राजा मेघंकर याला नृसिंहरूपात दर्शन दिले होते आणि कायम वास्तव्य करण्याचे अभिवचन दिले होते, असाही संदर्भ आहे. या मंदिरात विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राच्या पठणाचे विशेष महत्त्व आहे.
ही स्वयंभू श्रीमूर्ती अनेक शतके जमिनीखालील हेमाडपंती भुयारात बंदिस्त होती. (ते हेमाडपंती भुयार अद्यापही शाबूत आहे.) इ.स. १५६९ साली नागपूरचे नृसिंहभक्त श्री. श्यामराज पितळे यांनी ही श्रीमूर्ती त्या भुयारातून बाहेर काढून सध्याच्या मंदिरात प्रतिष्ठापित केली. तेव्हापासून साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला साडेचारशे वर्षांची परंपरा आहे.  

मेहकर येथील (दृष्टांत) नृसिंह :-      

चौदाव्या शतकाच्या ऊत्तरार्धात नागपूर येथे श्री शामराज पितळे हे महान नृसिंह ऊपासक राहत होते. ऊपासना करत असताना ऐका रात्री त्यांना स्वप्न पडले व स्वप्नात नृसिंहाने दर्शन देऊन सांगितले की "नागपूर पासून १२५ कोस पश्चिमेकडे महंकावती प्राचीन नगरी आहे. या नगरीच्या ऊत्तरेस व पैनगंगैच्या पुर्वेस एक पडका वाडा असेल त्या वाड्यात एक पिंपळांचा विशाल वृक्ष आहे. त्याच्या ऊत्तरेस तुळशी जवळ खोदावे म्हणजे भुयार सापडेल या भुयारात माझी विशालकाय पाषाणाची मुर्ती बंदिस्त करून ठेवण्यात आली आहे. मला मोकळे कर व तेथेच माझी ऊपासना कर".
   इ.स. १५६९ मध्ये स्वप्न दृष्टांत नुसार आज्ञा मानून ते मेहकर आले. त्याना सर्व खुणा आढळल्या. भुयारात प्रवेश करताच ते आश्चर्य चकित झाले त्याना तेथे भगवान प्रल्हाद वरद श्री लक्ष्मी नृसिंहाची साडेचार फुटाची ऊंच व तीन फूट रुंद अश्या भव्य मुर्तीचे दर्शन झाले. बाजुला नंदादीप तेवत होता व नुकतीच कोणी तरी पुजा केलेली दिसत होती. भुयार बाराफुट खोल होते. (दृष्टांत माहिती - वर्षा मिश्रा)
   भुयारातल्या श्रीमूर्तीला प्रतिष्ठापित केल्यानंतर श्यामराज पितळे मेहकरलाच राहिले. पुढे तीनशे वर्षांनी त्यांच्या घराण्यात साक्षात्कारी संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांचा अवतार झाला. त्यांचे जीवनचरित्र अद्भुतरम्य आहे.
   सध्या त्यांचे चौथे उत्तराधिकारी विद्यमान गुरुपीठाधीश ॲड. रंगनाथ महाराज पितळे आहेत. त्यांच्या आदेशानुसार संस्थानचे वर्षभर सतत धार्मिक व सामाजिक उपक्रम सुरू असतात. श्रावण महिन्यात एक आठवडाभर विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे रात्रंदिवस अखंड पाठ होतात. रात्रभर पुरुष आणि दिवसभर महिला एकही मिनिटाचा खंड न पडू देता या मंदिरात हे पाठ करतात. हा आध्यात्मिक क्षेत्रातला एक विक्रम आहे. विक्रमांची नोंद घेणाऱ्या संस्थेने या विक्रमाची नोंद घेतलेली आहे.
    नृसिंह नवरात्रोत्सवामध्ये श्रीमूर्तीला दररोज वार देवतेच्या पोषाखाने सजविले जाते. या पोशाखाचे दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडते. जगातील ११ पैकी ६ वे नृसिंह मंदिर असल्याने दूरवरून लोक मेहकरला दर्शनाला येत असतात. आणि सोबतच जवळच असलेल्या लोणार सरोवरालाही भेट देतात.
(माहिती - गोपाल पितळे) 

केवल नृसिंह, रामटेक, नागपूर :-

 नरसिंहाचे आपण अनेक प्रकारची शिल्पे पाहिली असतील.पण केवल नृसिंह हे त्यातील एक दुर्मिळ शिल्प.
नागपुर पासून जवळपास ४०-५० किमी अंतरावर असणाऱ्या आणि भोसल्यांच्या स्थापत्यकलेने नटलेल्या 'रामटेक' शहरातील एक पुरातन मंदिर..८० च्या दशकपर्यंत एक फार मोठे शिल्प स्थानिकांकडून पूजले जायचे. लोकांच्या-भक्तांच्या मते ते एका मारुतीचे शिल्प होते.
    पुण्यातील ज्येष्ठ इतिहास व पुरातत्व अभ्यासक जामखेडकर सर हे या हनुमानाच्या मंदिरात एका सर्वेक्षणासाठी आले होते.मंदिरातील साऱ्या भिंतीवर चुनखडीचा मोठा लेप देण्यात आलेला होता,ज्यामुळे मंदिरातील स्थापत्यशिल्प आणि कलेवर त्याचे दुष्परिणाम झाले असते,म्हणून ते साफ़ करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले,आणि ह्याच कामात अचानक हाती आला एक मोठा ठेवा..
    इसवी सन तिसऱ्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या विदर्भ आणि थोड्याफर प्रमाणात मध्य महाराष्ट्रात एक शक्तिशाली साम्राज्य उदयास आले.दोन शाखांमधे विभागल्या गेलेले 'वाकाटक' घराणे म्हणजे एक प्रतिष्ठीत घराणे.ह्याच घराण्यातील 'वत्सगुल्म' शाखेच्या राजांनी अजिंठा लेणीमधे आपल्या कलेची छाप उमटवली.आणि दुसऱ्या 'नंदिवर्धन' शाखेने विदर्भात अभुतपूर्व राज्यक्रांति केली.
गुप्त घराण्याशी वैवाहिक संबंध जोडून आपल्या साम्राज्याची सीमा वाढवणाऱ्या या शाखेची सून म्हणजे "प्रभावतीगुप्त"..!!
आणि तीच्या कारकिर्दीमधे हे मंदिर बांधण्यात आल्याचे उलेख मंदिरातील शिलालेखात आढळून आले. मंदिर संवर्धन करत असताना अचानक हाती आलेल्या ह्या शिलालेखामुळे इतिहास बदलला. वाकाटक साम्राज्याने मंदिर बांधल्याचा पहिला पुरावा हाती आला.पुरातत्वाची मदत घेऊन इतिहासचे नवे पैलू उलगडल्या गेले.
     आतल्या मुर्तीवर चढवलेला शेंदुराचा थर काढण्यात आला,आणि समोर आले हे अतिविशाल शिल्प.हे शिल्प मारुतीचे नसून,नृसिंहाचे होते.जवळ जवळ ६ फुट उंचीच्या ह्या शिल्पात असणारी अखंड नृसिंहाची मूर्ती निव्वळ अद्भुत आहे.हातात चक्र असल्याने ह्या मूर्तिला 'चक्रपाणी' ह्याही नावाने ओळखतात. लक्ष्मीशिवाय असणाऱ्या ह्या शिल्पाचा उल्लेख 'केवल नृसिंह' असा केला जातो.
     आज ही जागा पुरात्तव खात्याच्या अखत्यारित्या आहे आणि त्याचमुळे ही मूर्ती,मंदिरातील शिलालेख सुस्थितीत आहेत. पण लोकांची ह्या मारुतीवर श्रद्धा एवढी,की अगदी हुबेहुब ह्या शिल्पासारखे छोटे शिल्प तयार करुण आणून,मंदिराच्या समोरच छोट्या मंदिरात स्थापन करुण त्याला शेंदुर लावला आणि त्याची अजूनही मारुती म्हणूनच पूजा केली जाते..!!
    ह्याच मंदिरापासून थोड्या दुरवर अजून एक नृसिंहाचे मंदिर आहे.त्यातील शिल्पही तेच,मंदिर बांधनीही तीच आणि नृसिंहही एकटा..पण ह्याचे नाव 'रूद्रनृसिंह' प्रभावतीगुप्त हिने तीच्या पतिच्या,रुद्रसेना याच्या स्मृतीमधे हे मंदिर बांधले होते.
५ व्या शतकापर्यंत मध्य भारतावर जवळ जवळ २५० वर्षे राज्य केलेल्या ह्या साम्राज्याचे स्थापत्यकलेतील योगदान उलगडले आणि समोर आला एक वैभवशाली इतिहास..!! 

नृसिंह मंदिर, पुसद, यवतमाळ :-

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हे तालुक्याचे ठिकाण. या गावातील अटकेश्वर वॉर्डात हे नृसिंह मंदिर आहे. हि पुसदची जुनी वस्ती आहे. ह्या मूर्ती व मंदिराविषयी दंतकथा लोकमाणसात रुजली आहे. असे सांगतात कि, काशीच्या एका ब्राह्मणाला साक्षात्कार झाला व त्याने गावातील  उकिरडा बाजूस करावयास सांगितला. त्या खाली एक मोठी उभी शिळा दिसली. ती शिळा बाजूला केल्यावर मूर्ती नजरेस पडली. हि मूर्ती जेथे सापडली तेथेच चौथरा बांधून मंदिर बांधले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नागारखाना आहे. येथून आत गेले सहा पायर्या चढून सभामंडप लागतो. चुन्यात बांधलेला हा मंडप प्रशस्त असून छत उंच आहे. समोरच्या भिंतीला असलेल्या लहान झरोक्यातून गाभार्यातील नरसिंहाच्या उजव्या पायाचे व पितळी पादुकांचे दर्शन घडते. पाच पायर्या उतरून गेल्यावर गाभारा नजरेस पडतो. मूर्ती प्राचीन आहे. काहींच्या मते २००० वर्ष पूर्वीची तर काहींची ५०० वर्ष जुनी असल्याचे मत आहे. मूर्ती यवनांच्या भीतीपोटी लपवली असा अंदाज आहे. नरसिंह मूर्ती काळ्या पाषाणाची असून मूर्तीवर वज्रलेप केला आहे. मूर्ती द्विभुज असून ४ फुटाची आहे. एका हातात चक्र तर दुसरा हात मांडीवर ठेवला आहे. हातात बाजूबंद असून यज्ञोपवीत परिधान केले आहे. नार्सिन्हाचा चेहरा सौम्य असून नजर थोडी झुकलेली आहे. जटामुकुट परिधान केला असून बाजूला प्रल्हाद व लक्ष्मीच्या अंजनी मुद्रेतील मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ असून पाठीमागे विष्णूची चतुर्भुज मूर्ती भिंतीत बसवली आहे. विष्णूच्या बाजूला मध्यभागी सरस्वती व डाव्या बाजूला कालियामर्दन कृष्णाची मूर्ती आहे. नृसिंह जयंती ९ दिवस साजरी केली जाते. भंडारा होतो व साधारण १०००० लोक त्याचा लाभ घेतात. 

नरसिंह मंदिर, अंजी, यवतमाळ :-

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात असलेले अंजी हे गाव. येथे १२ व्या शतकातील प्राचीन भगवान नरसिंहाच मंदिर आहे. मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कोरीव स्तंभावर सभामंडप आहे त्यानंतर गाभार्यात नृसिंहाची मुर्ती आहे. मुर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहे असून मांडीवर हिरण्यकशपू आहे. मुर्ती खूप पुरातन असून अंदाजे १००० वर्षे जूनी असावी. चंद्रहास नावाच्या राजाने ही मुर्ती स्थापन केली अशी आख्यायिका गावकरी सांगतात.
महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रपदेश व कर्नाटक राज्यातून येथे भाविक येत असतात. धनत्रयोदिशीच्या दिवशी येथे किरणोत्सव सोहळा साजरा केला जातो. वैशाख पौर्णिमेला नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.  

नृसिंह मंदिर, जानोरी, बुलढाणा :-

जानोरी येथे नृसिंह मंदीर खूप प्राचीन आहे. येथील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती खूप प्राचीन आहे, या मूर्तीच्या चेहऱ्यावरील हाव भाव भारतातील कुठल्याच नृसिहं मूर्तीला नाहीत, नृसिंहाची प्रत्येक मूर्ती हि आक्राळ विक्राळ भाव असलेली आढळते, परंतु जानोरी येथील मूर्तीची मुद्रा शांत स्वरूपाची आहे, तशी मुद्रा भारतात कुठेच नाही, आपण जानोरी येथील प्राचीन नृसिंह मंदिराला भेट देऊन अनुभव घेऊ शकता.

नृसिंह मंदिर, देऊरवाडा, अमरावती





याशिवाय मोवाड, ता. नरखेड, जिल्हा नागपूर येथे वरंधा नदीच्या तीरावर फार पुरातन नृसिंह मंदिर आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी येथे पण पुरातन नृसिंह मंदिर आहे,

महाराष्ट्रातील महत्वाच्या विष्णु मुर्ती

शारंगधर बालाजी मेहकर


मूर्ती प्रेमींनी आयुष्यात किमान एकदा तरी पहावीच अशी सुंदर मूर्ती म्हणजे मेहकरचा (जि. बुलढाणा) शार्ङगधर बालाजी.
बुलढाणा जिल्ह्यात मेहेकर हे तालुक्याचं ठिकाण आहे जालना देऊळगावराजा, सिदखेड राजा, सुलतानपूर, मेहेकर, डोणगाव, मालेगाव अकोला या रस्त्यावर मेहेकर गाव आहे. अजिंठा टेकड्यांच्या पायथ्याजवळून पैनगंगा वाहते अन् या पैनगंगेच्याच काठी लावण्यसुंदर अशी श्री शारंगधराची प्रतिष्ठापना झाली आहे. मत्स्यपुराणात मेघंकर (मेहेकरचे मूळ नाव) नगरीचा उल्लेख आढळतो. तो असा- एतेषु पितृतीर्थेषु, श्राद्धमानन्त्यमश्नुते। तीर्थं मेघंकरं नाम, स्वयमेव जनार्दन ॥ ३१ ॥ त्याचप्रमाणे गौतमी माहात्म्यामधील श्लोकही मेघंकर नगरीचं वर्णन करतो
सालंकृता सर्वकाल, देवदेवेश शाङ्गणा । सोपानपंक्ति सर्वेषां, वैकुंठा रोहणायसा । अ.१३. श्लोक ४६
पु.ल. देशपांडे यांनी लिहिलं आहे, "मेहकरचा बालाजी पाहून पटतं लक्ष्मी नारायणाच्या प्रेमात का अडली असेल ते." तिरुपतीमधील श्री बालाजीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर अन् विलोभनीय अशी जगातील सर्वात उंच शारंगधर बालाजीची मूर्ती विदर्भातील मेहकर गावात विराजमान आहे. ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाडी असलेल्या मूर्तीचे सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. या मूर्तीचा इतिहासही रंजक आहे
या मुर्तीची सविस्तर माहिती घेण्यापुर्वी याचा इतिहास समजून घेउया.
जंबू द्वीप आणि भारतवर्ष या नावाने ओळखला जाणारा भारत हा इतिहासापेक्षा जुना आहे जोपर्यंत कला, इतिहास, पुरातत्व आणि धर्माचा संबंध आहे, तो प्रत्येकापेक्षा दुर्मिळ आणि अद्वितीय अशा अमूल्य रत्नांचा खरा खजिना आहे. या प्राचीन भूमीतील अशा दुर्मिळ आणि मौल्यवान खजिन्यांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील पेनगंगा नदीच्या काठावर मेहकर नावाचे एक महान पुरातन ठिकाण आहे. प्राचीन काळी ती मेघणकर नगरी म्हणून ओळखली जात होती आणि त्याचा उल्लेख स्कंद पुराण, पद्म पुराण, मत्स्य पुराण आणि आईन--अकबरी मध्ये आढळतो. नदीकाठच्या जंगलात अनेक ऋषी-मुनी राहत होते.
पौराणिक कथेनुसार, सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात, भगवान ब्रह्मदेवाने एक भव्य यज्ञ सुरू करताना आपल्या प्रणितपत्र’ वापरून पेनगंगा नदीची निर्मिती केली. या नदीत डुबकी मारणे आणि आपल्या दिवंगत नातेवाइकांचे श्राद्ध येथे करणे अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या वनवासाच्या काळात प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता नाशिकजवळील पंचवटीला जाताना या भागात गेले. मेहकरमध्ये हरण टेकडी किंवा हिरण टेकडी नावाचे एक ठिकाण आहे, जिथे श्री रामाने हरणाची शिकार करून मारते असे म्हणतात. त्या जागेची खूण करण्यासाठी आता तिथे एक जीर्ण मंदिर आहे
मेघनकर नावाचा एक दैत्य या परिसरात राहत असे आणि ऋषींच्या यज्ञकुंडाना अपवित्र, करून आणि त्यांची हत्या करून खाऊन त्यांच्या कर्मकांडात आणि तपश्चर्यामध्ये गंभीर व्यत्यय आणत असे. ऋषीमुनी आणि ऋषींनी अनेक वर्षे भगवान हरीची त्यांच्या अत्याचारापासून सुटका करण्यासाठी प्रार्थना केली. स्थानिक पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या
प्रसिद्ध सारंग किंवा शारंगा धनुष्याचा वापर करून राक्षसाचा वध केला. असे असू शकते की स्वतः श्री रामानेच असुराचा वध केला होता ज्याप्रमाणे त्याने जंगलात प्रवास करताना इतर अनेकांना भारले होते. भगवान रामाचे धनुष्य सारंगा या नावानेही प्रसिद्ध आहे.मरणासन्न मेधनकरांच्या प्रार्थनेवर, परमेशराने त्या जागेचे नाव मेघनकर ठेवण्यास सहमती दर्शविली, जी नंतर मेहकरमध्ये बदलली गेली. कृतज्ञ साधु आणि मुनींनी परमेश्वराला त्याच्या चतुर्भुज स्वरुपात (चतुर्भुज विष्णु स्वरूप) राहण्यासाठी प्रार्थना केली, चक्र, गदा, पद्म आणि शेख यांसारख्या विविध प्रतीकांच्या विशिष्ट स्थानामुळे देवतेला बालाजी म्हणून ओळखले जाते
पण शारंगधर का? परमेश्वराच्या चार हातामध्ये धनुष्य दिसत नाही. याचे उत्तर असे की देवतेच्या मुकुटात शारंगा धनुष्य घरलेल्या भगवान विष्णूची बसलेली प्रतिमा आहे. शारंगधर बालाजीचे देवता ११.५ फूट उंच आहे आणि मंदिराच्या पुजाऱ्यानुसार गंडकी पाषाणाच्या एका स्लॅबमधून कोरलेले आहे. मराठीत पाषाण म्हणजे दगड गंडकी पाषाणचा अर्थ एकच आहे तो म्हणजे शालिग्राम शिळा कारण हे दगड नेपाळमधील गंडकी नदीत मोठया प्रमाणात आढळतात.

 





या मुर्तीच्या शोधाची कथाही काही कमी रोचक नाही. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १८९०, शुक्रवार म्हणजे ७ डिसेंबर १८८८ रोजी त्या छोट्या खेड्यात एक आश्चर्यजनक नि खळबळजनक घटना घडली. श्री. रामभाऊ भिते पाटील यांनी इमारती बांधण्यासाठी पाया खोदण्याचं काम सुरू केलं. मातीच्या खाली दगड अन् विटांचा थर लागला. तो दूर करण्याचं काम सुरू झालं. कुदळीच्या घावाबरोबर 'खण्ण' असा धातूचा आवाज आला. रामभाऊंनी काम थांबवलं अन् हातानं माती बाजूला सारली. खोदकाम करताना मजूराना एक मोठा लाकडी आयताकृती पेटी सापडली. त्या पेटीचा आकार पाहून ते थक्क झाले. ती १५ फूट लांब आणि अडीच फूट रुंद होती. हिरवा-निळा झालेला तांब्याचा तो पत्रा होता, येथे दगडावर कोरलेल्या बाणाचं टोक असलेल्या दिशेकडे खालच्या मूर्तीचं मस्तक होतं. दोन-अडीच सें.मी. जाडीचा अन् तब्बल पावणेदोन मीटर रुंदीचा हा तांब्याचा पत्रा होता. सर्वांना गुप्तधनाचीच शंका आली. पत्र्याखाली लाकडाचा (बहुदा चंदनाच्या लाकडाचा) भुसा होता. तो भुसा दूर करताचा काळ्याभोर चकचकीत पाषाणी मूर्तीची साजिरी पदचिन्हे आढळली. गावच्या प्रतिष्ठित मंडळींना बोलावून हळुवार हातानं मूर्ती मोकळी केली. शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेली श्रीविष्णूची प्रसन्न मूर्ती सर्वांना दिसली. भगवान विष्णूंची ती देखणी मूर्ती अप्रतिम सौंदर्याचा साक्षात नमुना होती. हिंदू दिनदर्शिकेनुसार ती होती मार्गशीर्ष शुक्ल पंचमी, शुक्रवार, श्रवण नक्षत्र, गोरज मुहूर्त, नाग दीपावली. छोट्या गावात ही बातमी वेगाने पसरली. .. देव निघाला म्हन्तात्...' करत आजूबाजूच्या गावांमधून हीऽऽ गर्दी जमली. हळद-कुंकवाचे सडे पडले, नगारा झडला अन् ग्रामजोशांनी- श्रीपत भटजींनी यथासांग पूजा केली. आरती झाली. साखर वाटली. गावात गढी, होतं सरकारी ठाणं मोगलाई गेली, अंगरेजी आल्यापासून मग बाहेर झाले बंगले, गढी वसान त्याजागी केल्या शाळा, सरकारनं ... केला वसरीचा आकार रामभाऊनं पाया खोदाय गेले लागल्या फरशा दोन दगडाचा जोड वर, खाली विटा संगिन .. काढला विटेचा थर, विटेखाली मलमा गीर जग लाविती कपाळाला, सुवास फार मग उघडी केली मूर्त, झाले सुर्त (श्रृत), अवघ्या नगरात झाले प्रभूचे दर्शन, उतरले आत असा झाला रयतेचा जमाव, माणूस मावेना एकूण एकावर लोटती, असा धिंगाणा आले मुलं लोकरं बाया, लागती चरणा बाकी इतर लोक म्हणती दर्शन लेना नाही मुंगी जायला रीघ देवदर्शना मेहेकरच्याच कडतुजी चव्हाण यांनी या घटनेचं वर्णन मोठ्या चपखलपणे आहे. या पोवाड्यात त्यांनी मूर्तीचं वर्णनही नेटक्या शब्दांत केलं आहे. केलं आहे.
               देवा पायापाशी जयविजय, भूमिका शोभे
                    लक्षुमीबाईसह ते चौघे उभे 
                    सरळ मांड्या पोटऱ्या सुभग पाय
                    पायी वाक्यातोडे गुजऱ्या पैंजण आहे 
                   कटि कसला पीतांबर निऱ्याचा घोळ
                    देती ढाळ, कमरेशी आहे कळसूत्र अलंकार फार 
                    वरते पोटाचं दोंद करी झळझळ
                   गळ्यात यज्ञपवित अतिनिर्मळ
                    गळा वैजयंती ही माळ, चंद्रहार दिसे सुंदर 
                   कानी कुंडलाची प्रभा तेज फार 
                   आहे रंग सावळा विष्णु सारंगधर 
                  हो, चतुर्भुज महाराज दिगंबर 
                  हाती शंख, चक्र, गदा पद्म समोर
                 अहो दंडामध्ये दंडपेट्या, पवित्रा, शोभती बोटावर 
                 हे हर्षवदन देवाचे, माशुक गाल 
                  गालावरते मुंजरा नाक सरळ गंध लाल 
                  आकर्ण नेत्र भुवया कमानी गोल 
                 भाळी केसरी मळवट, कुरळे बाल
                  शिरी जडावाचा मुकुट दिसे अनमोल 
                  प्रभावळीत दशअवतार दिसे समतोल 
                   मुकुटात मूर्ती आहे सारंगधराची 
                  देव विष्णु जागती ज्योत महिमा त्याची
                   इथं उतरले भगवान तीर्थ पाहून 
                  तीर्थ नावाची, देव विष्णु जागती ज्योत महिमा त्याची
      होता होता ही वार्ता बुलढाण्याच्या कलेक्टरच्या कानावर गेली. मूर्तीबरोबर सापडलेलं अतिशय महत्त्वाचं ताम्रपट बुलढाण्याला रवाना झालं होतं; पण मूर्ती मात्र अजूनही मेहेकरलाच होती.
मूर्तीच्याच पीठाच्या खाली त्याच दगडाचा एक एकसंध निमुळता भाग सुमारे एक मीटर होता. तो तिथल्याच एका कडुनिंबाच्या वृक्षासमोर खड्डा खणून त्यात तो निमुळता भाग घालून बुंध्याच्या आधारे ही मूर्ती उभी केली होती. रोज तिची पूजाअर्चाही सुरू झाली होती.
रायगडावर शिवस्मारकाची आबाळ पाहून व्यथित होणारे सर रिचर्ड टेंपल हे आता बुलढाण्याचे कलेक्टर होते. शिवस्मारक अन् रायगडाची रेखाचित्रे स्वतः काढून आपल्या अधिकारात तेथील दुरुस्ती व देखरेखीच्या आज्ञा देणारा हा इंग्लिश अधिकारी होता. घोड्यावर बसून हे जिल्हाधिकारी मेहेकरला आले. मूर्तीचं अपूर्व सौंदर्य पाहून ते प्रसन्न झाले. विलायतेमध्ये ही मूर्ती पाठवली, तर तेथील वस्तुसंग्रहालयाचं ते भूषण ठरेल, हा विचार त्यांच्या मनी आला.टेंपल साहेबांना ती मूर्ती म्हणजे एक शिल्प वा मूर्ती वाटत होती. पण इथल्या गावकऱ्यांना 'इथे अवतरले भगवान' असं वाटत होतं. आपापल्या परीनं दोघांचंही बरोबर होतं.मूर्ती नेण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना करून साहेब बुलढाण्याला परतले अन् इकडे खळबळ माजली.त्यावेळी गावचे तहसीलदार अंबादास संती देशपांडे नावाचे गृहस्थ होते आणि पोलीस पाटील रंगनाथ जोशी होते. लंडनमधील ब्रिटीश म्युझियममध्ये जतन करण्यासाठी इंग्रजांनी मूर्ती इंग्लंडला नेण्याचा निर्णय घेतला होता हे त्यांना समजले. त्यांनी स्थानिक लोकांना माहिती दिली आणि सुचवले की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा किंवा विधी अभिषेक लवकर करावा, कारण एकदा मूर्तीचा अभिषेक झाला की तिची नियमित पूजा करावी लागते आणि ती हलवता येत नाही. मात्र, त्यावेळी शुभ मुहूर्त किंवा मुहूर्त उपलब्ध नसल्याने काय करावे, या संभ्रमात ते पडले होते. पण गावकर्‍यांनी मूर्ती गावाबाहेर जावू द्यायची नाही असा पण केला.यावेळी जानकीराम आप्पा पाठक, रामभाऊ पिटे पाटील, अण्णासाहेब देशमुख आदी गावातील काही प्रतिष्ठित व ज्येष्ठ मंडळींनी शुभ मुहूर्त वगैरेची तमा न बाळगता देवतेला अभिषेक करण्याचा निर्णय घेतला..पहाटे ४ वाजता मुर्तीची प्राणप्रतिष्ठा मंत्रघोषाने झाली. मुर्तीची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली. हजारो लोकांनी प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती हलवू देणार नाही असा आग्रह धरला.
 मूर्ती नेण्यास खुद्द टेंपलसाहेब येण्याच्या दिवशी भोवतालच्या सर्व खेड्यापाड्यांतून हजारो लोक जमा झाले. 'जय जय गोविंद, जयहरी गोविंद,' 'लक्ष्मीरमण शाऽऽरंगधर गोऽऽविंद', 'बालाजी महाराजकी जय' असा घोष त्यांनी लावला होता. रिचर्ड टेंपल विचारी होते. अवघ्या जनसमुदायाला लाथाडून शक्तीच्या जोरावर ही मूर्ती नेणं शहाणपणाचं नाही, हे त्यांना उमगलं. अंबादास पंत व अण्णासाहेब यांनी साहेबांना हे समजावून सांगितलं. मूर्तीतील सौंदर्याबरोबर मूतींतील देवही जिल्हाधिकाऱ्यांना जाणवला. स्थापना झालेली, पूजाअर्चा होणारी मूतीं हलवली तर हिंदू रयतेच्या भावना दुखावतील, क्षोभ निर्माण होईल, म्हणून साहेबानं मूर्ती नेण्याचा बेत तर रहित केलाच. पण गढीवरील सर्व जमीन आणि त्या जमिनीतून निघणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी या मंदिराला देण्याचा हुकूम काढला. शेवटी धार्मिक बाबीत हस्तक्षेप करायचा नाही या १८५८ च्या राणीच्या जाहिरनाम्यातील कलमाच्या अनुषंगाने इंग्रज अधिकार्‍यांनी आपला निर्णय मागे घेतला.  टेंपलसाहेब रित्या हातानं पण जनतेच्या जिंकलेल्या मनांसह माघारी गेला. आता भलंथोरलं मंदिर उभारण्यासाठी सरकार, सरदार, सावकार अन् जनता एकत्र आली. शिवरामभाऊ या ओव्हरसीयरनी देवळाचा नकाशा काढला, त्याबरहुकूम काम सुरू झालं. देवळाचा पाया खणता खणता आणखी चार मूर्ती सापडल्या. त्याही अशाच देखण्या नि सालंकृत.
   मात्र इंग्रजांनी शिलालेख असलेली ताम्रपट काढून घेतला. या कृत्यामुळे जानकीराम आप्पा पाठक व इतर दोघांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला आणि रामभाऊ भिटे पाटील यांना पाटील पद गमवावे लागते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६० हून अधिक व्यक्तींना विविध ढोल-ताशांच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले आणि त्यांना विविध प्रकारे शिक्षा देण्यात आली.
मुर्ती ठेवण्यासाठी एक लहान तात्पुरते मंदिर बांधले गेले. विष्णु मुर्ती सापडल्याची बातमी पसरताच आजूबाजूच्या अनेक गावातील लोक आले आणि त्यांनी सध्याचे मंदिर बांधण्यासाठी उदार हस्ते योगदान दिले. जानकीराम आप्पा पाठक यांनी आपले संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केले. ते अनेक ठिकाणी भागवत कथा करायचे आणि मिळालेला सर्व पैसा मंदिराच्या सेवेसाठी सोपवायचे. दूरदूरच्या ठिकाणी हि बातमी पसरवण्यात आणि सध्याच्या मंदिराच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला पैसा मिळवण्यासाठी अनेकांना प्रेरणा देण्यात त्यांचा मोठा हात होता. मंदिराच्या शिखरावर सुवर्ण कुंभाची स्थापना १९१३ मध्ये मेहकर येथील निवासी वारकरी संत श्री बाळाभाऊ पितळे यांच्या आश्रयाने करण्यात आली, ज्यांना परिसरात भगवान नरसिंहाचा अवतार मानले जाते.
लटकल्या बिलोरी हंड्या, फुलं चमकती मध्यभागी शोभे झुंबर लखलख ज्योती सन्मुख फुलाचा बाग, कमानाभोवती शुद्धपौर्णिमेच्या दिवशी पालखी, निघाली देवाचं वहान पुष्कळ यात्रा आली चहुदिशांवरून झाला उत्सवाचा थाद, मिळेना वाट चौरस्त्यानं असा मोठा धमाका उडाला. आनंदीआनंद झाला. शताब्दी सोहोळ्याची तयारी चालू असताना नोव्हेंबर १९८८ मध्ये श्री शारंगधराची एक छोटी सुंदर मूर्ती सापडली. श्री बालाजी शताब्दी सोहोळ्याच्याच नेमक्या वेळी हा योग यावा हा आनंददायी शकुनच आहे, असं सर्वांनी मानलं, तर त्यात चूक काहीच नाही. बालासाहेब ट्रस्ट व हजारीमल ट्रस्ट यांच्यापासून सध्या देवस्थानला विविध उपक्रमांसाठी साहाय्य मिळतं. देवस्थानला पूवीं मिळालेली शेतजमीन कुळांकडे गेली. त्यामुळे मंदिराच्या मालकीच्या जागांचं भाडं व पेटीत जमा होणारं द्रव्य एवढीच उत्पन्नाची बाब आहे.
 
• श्रीशारंगधर मूर्ती श्री विष्णुमूर्ती साडेअकरा फुटाची ही भव्य, काळ्या कुळकुळीत पाषाणाची अन् घासून गुळगुळीत केल्यानं तेजस्वी आहे. भगवान विष्णूचं ते सुंदर ध्यान पाहताच,
लाचावले मन लागलीसे गोडी। ते जीवे न सोडी, ऐस जाहले ।। सौदर्य, भव्यता, प्रमाणबद्धता, रेखीवपणा, बारीक-सारीक तपशील बिनचूक असणारी ही एकसंध मूर्ती पाहताच मन थक्क होतं. बालाजी ऊर्फ बालासाहेब या नावानं त्या भागात ओळखल्या जाणाऱ्या या मूर्तीचं वर्णन तेथीलच एका खेडूतानं केलं, ते असं : 'बालासाहेब फक्त बोलायचे तेवढे शिल्लक आहेत' यात किंचितही अतिशयोक्ती नाही. प्रभावळीसकट ३ ॥ मीटर उंचीच्या या एकसंध शिल्पात शारंगधराची उंची ३ मीटर भरते. मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीलक्ष्मी, तर उजव्या बाजूला श्रीभूदेवी आहेत. तेथेच जयविजयही कोरलेले आहेत. मूर्तीमागील प्रभावळीत मूर्तीच्या उजव्या बाजूला हातांच्या तळव्यांच्या रेषेत दशावतारांपैकी मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन या मूर्ती खालून वर या क्रमानं तर मूर्तीच्या डाव्या अंगाला परशुराम, कृष्ण, राम, बौद्ध, कलंकी या मूर्ती वरून खाली या क्रमानं खोदल्या आहेत. मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात पद्म, वरच्या उजव्या हातात गदा, वरच्या डाव्या हातात चक्र व खालच्या डाव्या हातात शंख अशी आयुधं आहेत. या पगचश क्रमामुळे ही मूर्ती मूर्तिशास्त्रदृष्ट्या त्रिविक्रमाची ठरते.पण मेहकरला या मूर्तीला शारंगधर बालाजी म्हटले जाते. मूर्तीचा अप्रतिम असा मुकूट आहे त्यावर शार्ङग नावाचे धनुष्य हाती घेतलेले विष्णुची प्रतिमा आहे म्हणून याला शार्ङगधर म्हणतात. मुकुटाच्या मध्यभागी धनुर्धारी श्रीराम मूर्ती आहे.. शारंगधर म्हणून नाव आहे.  गळ्यातील वैजयंतीमाला, कानांतील कुंडलं, यज्ञोपवीत, तळहातावरील सूक्ष्म रेषांचे हुबेहूब चित्रण थक्क करते. कटिमेखला, अंगावरील वस्त्राचा तलमपणा, आयुधं धारण करताना असणारी बोटांची ठेवण, त्या लांबसडक बोटांमधील अंगठ्याचा तपशील, डोक्यावरील सारंगधर मूर्ती (धनुष्यधारी, बैठी मूर्ती) असणारा करंडक मुकुट व त्यावरील जडावाचा तपशील तसंच चेहऱ्यावरचं मंद स्मित प्रसन्नभाव जागृत करतं. उभ्या महाराष्ट्रात अशी मूर्ती नाही. या अजोड शिल्पकामाची प्रकाशचित्रं (फोटो) काढून ते विक्रीस ठेवायला हवेत. रेखीव प्रमाणबद्ध आयुधधारी हातांची कमनीयता मनावर ठसेल अशी प्रकाशचित्रं उपलब्ध करून द्यायला हवीत. हा महाराष्ट्र वैभवाचा कळसाध्यायच आपल्या प्राचीन शिल्पकारांचं महत्त्व आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना स्मरेल अशी तरतूद करायला हवी. दिवसात काही काळ का होईना ही मूर्ती अनलंकृत स्वरूपात दिसेल अशी व्यवस्था करायला हवी, त्यामुळे हे मूर्तिवैभवही भाविकांना पाहता येईल.
  या मूर्तीसोबत असलेले ताम्रपट अतिशय महत्त्वाचे आहेत. या मूर्तीच्या आजवर अज्ञात असलेल्या इतिहासावर ह्यातून प्रकाश पडेल. पण मूर्ती नेता न आल्यावर एक शतकापूर्वी ब्रिटनमध्ये नेण्यात आलेल्या त्या ताम्रपटांच्या शोधाचा पद्धतशीर प्रयल कोणी केल्याची नोंद नाही. पण असा प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. कदाचित लंडनमधील वस्तुसंग्रहालयात असणाऱ्या या ताम्रपटांना हिंदुस्थानात आणणं जरी जमलं नाही, तरी त्यात काय लिहिलं आहे, याचा शोध घेतला जाणं अत्यावश्यक वाटतं
बहुदा तेराव्या शतकात धर्मांध, आक्रमक, परकीय मुस्लीम सत्ताधीशांच्या स्वाऱ्या दक्षिण हिंदुस्थानात सुरू झाल्या ह्या मूर्तिभंजकांच्या तावडीतून अशा देवमूर्ती जमिनीत पुरून ठेवून विध्वंसापासून वाचवायच्या मिषानं ही शारंगधर मूर्ती भूमिगत केली गेली असावी, असा संशोधकांचा कयास आहे. म्हणूनच मूतींचं मस्तक दाखविणारा बाण कोरलेली शिळा त्याजागी ठेवलेली असावी. या वेळी उपलब्ध झालेल्या ताम्रपटांखेरीज अन्य कोणताही मार्ग त्या मूर्तीच्या पूर्वेतिहासावर प्रकाश टाकण्यास असमर्थ आहे. याच परिसरात आणखी उत्खनन करता आलं, तर आणखीही प्राचीन मूर्ती-शिल्पावशेष हाती लागण्याचा संभव आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न करायला हवेत. औरंगाबाद/खडकी सारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गजबजलेल्या पर्यटन पंढरीजवळ असणाऱ्या मेहेकरला त्याचं योग्य ते स्थान मिळवून देणं अवघड नाही. त्या दृष्टीनं प्रयत्न मात्र करायला हवेत.
    तांब्याचा शिलालेख उपलब्ध नसल्यामुळे, १२ व्या ते १४/१५व्या शतकातील मुस्लिम आक्रमणांच्या काळात अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, ज्याने आपली राजधानी जवळच्या दौलताबाद येथे हलवली आणि त्यानंतर औरंगजेब याच्या आक्रमण काळात या प्रदेशातून जाताना, अनेक हिंदू मूर्ती एकतर विहिरीमध्ये लपवून ठेवल्या होत्या किंवा त्यांना अपवित्र  होण्यापासून वाचवण्यासाठी जमिनीखाली खोल गाडल्या होत्या. शारंगधर बालाजीच्या बाबतीतही असेच झाले असावे
    जसे जगन्नाथ पुरी येथे परमेश्वराचे रूपाने तिरुपती व पंढरपुरात नाद रूप श्री विठ्ठलाचे आणि नाथद्वारात अष्टकाली रूपाचे दर्शन होते, तसेच मेहकर येथे बालाजीचे आत्मरूपाचे दर्शन आपल्याला मिळते. याचा अर्थ आपल्या अंत: करणात जी काही भावना आहे तीच मेहकर येथील परमेश्वराच्या चेहऱ्यावर दिसून येते. आपण आनंदी, दुःखी, रागावलेले किया थकलेले असो, भक्ताच्या चेहयावर एकच भाव दिसून येतो. यामुळे आत्मरूपाचे दर्शन देणारे हे ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण आहे
    ही  मूर्ती आशिया खंडातील सर्वात मोठी श्री बालाजीची मूर्ती आहे. तसा उल्लेख बुलडाणा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये आहे. तीर्थक्षेत्रांच्या यादीत या मंदिराचे नाव असले तरी याला अद्याप हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही.
    जालन्यापासून  वाशीमकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर आहे. आता समृद्धी महामार्ग पण मेहकर जवळुन जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) पासून  १२५ किमी अंतरावर विदर्भात मेहकर हे गाव आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर हे  गाव असूनही जगाला या अद्भुत मूर्तीसह मंदिराची माहितीच नाही. पैनगंगा नदीकाठी जुन्या लाकडी, परंतु अत्यंत रेखीव वाड्यात हे मंदिर आहे.मूर्तीचा  शोध लागण्यापूर्वी हे गाव नृसिंहाचे स्थान म्हणून ओळखले जात होते. येथे लक्ष्मीनृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. ही मूर्तीदेखील एका भुयारात होती. १५ व्या शतकात ती गावकऱ्यांनी गावात आणली. त्यानंतर ३१९ वर्षांनी गावात शारंगधर बालाजीची मूर्ती सापडली.
    मेहकरचे ज्येष्ठ मराठी कवी ना. घ. देशपांडे यांनी या मूर्तीवर सुंदर काव्य रचले. तिनेच मी या मूर्ती व्रताच्या काल्याच्या किर्तनाचा शेवट करतो. 
त्रिविक्रमा हे, हे जगदंतर, सुंदर शार्ङगधरा 
तव चरणाशी लक्ष्मी सुंदर 
जय विजयाचे युगूल मनोहर
अवताराची तूझी प्रभावळ मनमोहन श्रीधरा ।।१।।
तूझे गीत गाते हे मंगल
अविरत निर्मळ गंगेचे जळ
पिउन ते, ही सस्यश्यामला प्रमुदित होते धरा ।।२।।
शिखराभवती शुभ्र पाखरे
प्रदक्षिणा करतात तूला रे
धुंडतात हे तुला सारखे अगोचरा गोचरा ।।३।।
पडतो मी पण तू वरती धर
व्यथित असा मी तू करूणाकर
हे करूणामय तूझ्यात आहे पूर्णकृपेचा झरा ।।४।।
- ना.घ. देशपांडे 
(श्री व्यंकटेश व कालहस्तीश्वर, ले. रा.चिं. ढेरे, प्रकाशक पद्मगंधा)

शेंदूर्णीचा त्रिविक्रम विष्णु :-

वामनाने तीन पावलांत स्वर्ग पृथ्वी पाताळ जिंकून घेतले या रूपाला त्रिविक्रम विष्णु म्हटलं जातं. सहसा केशवराज विष्णु या रूपातील मुर्ती जास्त आढळून येतात (पद्म, शंख, चक्र, गदा असा शस्त्र क्रम). त्रिविक्रम रूपातील मुर्तीच्या हातातील शस्त्र क्रम पद्म, गदा, चक्र आणि शंख असा असतो (डावीकडून उजवीकडे). अशी ही त्रिविक्रम विष्णु मुर्ती शेंदूर्णी (ता. जामनेर, जि.जळगांव) येथे आहे. या विष्णुच्या शक्तीला क्रिया असे म्हणतात. सोयगांव पासून हे गांव अतिशय जवळ आहे. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजूची प्रभावळ ही जवळपास मुर्ती इतकीच आहे. एरव्ही प्रभावळीवर कोरलेले दशावतार फार लहान असतात. पण इथे मुर्तीच्या सोबत जणू सर्व विश्वच कोरले आहे. आणि त्याचे कारणही परत तीन पावलांत जग व्यापणारा त्रिविक्रम दाखवायचा आहे.ही मुर्ती अगदी उकिरड्यात पडलेली होती. शेंदूर्णीच्या एका सत्पुरूषाला दृष्टांत झाला. उकिरडा उकरला गेला आणि ही पाच फुटी भव्य मुर्ती सापडली.
येथे आषाढी एकादशीला व कार्तिकी एकादशीला त्रिविक्रमाची मोठी यात्रा भरते.आषाढी एकादशीला पंढरपूरचा विठ्ठल शेंदुर्णीला त्रिविक्रमाच्या मंदिरात आलेला असतो अशी श्रद्धा आहे. शेंदुर्णीच्या ज्या सत्पुरूला त्रिविक्रमाच्या मूर्तीचा साक्षात्कार झाला ते सत्पुरूष कडोबा महाराज. त्यांचे शेंदुर्णीला मोठे मंदिर आहे. यात्रेकरू त्रिविक्रमांच्या दर्शना सोबतच कडोबा महाराजांचे ही श्रध्देने दर्शन घेतात.
या दंत कथेतला खरेखोटेपणा आपण बाजूला ठेवू. पण गावकर्यांनी भव्य मंदिर उभारून या अप्रतिम मुर्तीची जोपासना केली हे महत्वाचे. ग्रामीण पर्यटन वाढवायचे तर अशी ठिकाणं लोकांपर्यंत समोर आणली पाहिजेत. तिथपर्यंत किमान चांगले रस्ते बनवले पाहिजेत.

वामन-दामोदर दूर्मिळ विष्णुमूर्ती


पैठण (ता. पैठण जि. औरंगाबाद) येथील धूंडीनाथ महाराज मठात या दोन विष्णुमूर्ती आहेत. सहसा विष्णुच्या "केशव" मूर्ती जास्त ठिकाणी आढळतात (पद्म, शंख, चक्र, गदा असा आयूधक्रम). पण या दोन मूर्ती वेगळ्या आहेत. डावीकडची मूर्ती वामन या नावाने ओळखली झाते. आयुधांचा क्रम प्रदक्षिणा मार्गाने असा आहे- शंख, चक्र, गदा, पद्म. या मूर्तीला ग्रीवीका, उदरबंध अलंकार वेगळे आहेत. बाकी हाता पायातील तोडे मेखला दूसर्या मूर्तीसारखेच आहेत. पाठशीळा पंचकोनी आहे.
उजवीकडची मूर्ती दामोदर नावाने ओळखली जाते. प्रदक्षिणा क्रमाने आयुधं अशी - पद्म, शंख, गदा, चक्र. या मूर्तीच्या गळ्यात ग्रीवीका नसून हार आहे. करंड मुकूटच आहे पण जास्त उंच आहे. मागची प्रभावळ मोठी आहे. खाली चामरधारिणी, सेवक आहेत. याची पाठशीळा अर्धवर्तूळाकार आहे.
या मठाचा जिर्णाद्धार होणे अभ्यासकांच्या, वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही गरजेचे आहे. 

औंढा नागनाथचा केशव :-

औंढा नागनाथ मंदिरात काचेत ठेवलेली ही विष्णुमुर्ती शिल्पकलेचा अत्युच्च नमुना मानली जाते. या मुर्तीला केशव हे नाव दिलेले आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, उजव्या वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात चक्र व खालच्या हातात गदा आहे. मुर्तीवर इतके बारीक कोरीवकाम आहे की बोटावरचे नखंही दिसतात. मराठवाड्यात सापडलेल्या बहूतांश विष्णु मुर्ती केशवराज मुर्ती अशाच प्रकारातील आहेत. या रूपातील विष्णुची जी शक्ती आहे तीला किर्ती" या नावाने संबोधले जाते. मागच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आढळून येतात. १९७२ च्या दूष्काळात रोजगार हमी योजनेत तळ्याचा गाळ काढत असताना ही मुर्ती सापडली. ही मुर्ती गर्भगृहा जवळ ठेवलेली आहे. तिथून काढून मंदिर आवारतच पण बाहेर ठेवावी. जेणेकरून शिल्प अभ्यासकांना नीटपणे पहाता येईल. तसेही आत गर्दी करणारे आंधळे भाविक इकडे पहातच नाहीत. आणि ज्यांना पहायची आहे त्यांना धक्कीबुक्की गर्दीत पहाताही येत नाही. (छायाचित्र सौजन्य अमर रेड्डी)

श्रीधर विष्णु :

 
 मंदिरांच्या बाह्य भागातील देवकोष्टकांत कोणती देवता आहे त्यावरून आतील मूख्य मूर्तीबाबत अनुमान लावले जाते. ही विष्णुची मूर्ती गुप्तेश्वर मंदिराच्या (धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) दक्षिणेला बाह्य भागातील देवकोष्टकांत स्थित आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात चक्र, डाव्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात शंख असा क्रम आहे. या विष्णुला श्रीधर असे नामाभिधान आहे. या विष्णुची जी स्त्री शक्ती आहे तीला "मेधा" असे संबोधतात. अशी विष्णुची २४ नावे आणि त्यांच्या २४ शक्ती आहेत. या मूर्तीला मोजकेच पण रेखीव असे दागिने दाखवले आहेत.
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात सध्या महादेवाची पिंड आहे.
जो पाय उभा आहे नेमके बरोबर त्याच बाजूला विष्णु जरा कललेला दाखवला आहे. दूसरा पाय दूमडलेला असून त्याचा तळवा आत वळवलेला आहे. खाली टेकलेल्या पायाची बोटंच फक्त जमिनीला स्पर्श करत आहेत. टाच अधर आहे. डौलदारपणा मूर्तीला प्राप्त झाला आहे. नसता शास्त्र सांगत आहे त्याप्रमाणे श्रीधर विष्णु म्हणजे पद्म चक्र गदा शंख दाखवलेकी काम संपले. पण इथे या डौलदारपणात शिल्पकाराची प्रतिभा दिसून येते. डावी मांडी मुडपलेली असल्याने त्या ठिकाणची गादी दबलेली आहे. उलट उजवा पाय खाली सोडला असल्याने त्याखालच्या गादीला उभार आहे. या बारकाव्यांतून कौशल्य दिसून येतो.
मूर्ती उभ्या स्वरूपात असेल तर तीला स्थानकमूर्ती म्हणतात. बसलेली असेल तर आसनस्थ म्हणतात. गर्भगृहातील जी मुख्य मूर्ती आहे ती केशव विष्णुची आहे. ही मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरात नसून बाजूच्या मंदिरात आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात सध्या महादेवाची पिंड आहे.

योगमुद्रेतील विष्णु :-

जाम (ता.जि.परभणी) येथील मंदिरावर बाह्यभागात दशावतार मूर्ती शिल्पांकित आहेत. त्यावरून या मूर्तीला चुकून बौद्ध अवतारातील विष्णु संबोधले जाते. पण मूर्तीला चार हात असून वरच्या दोन हातात शंख आणि चक्र स्पष्ट दिसत आहेत. त्यावरून हा विष्णु असल्याचे स्पष्ट होते. खालील दोन हात योगमुद्रेत असून उजव्या हातात पद्म आहे. पद्ममासनातील ही मूर्ती दूर्मिळ आहे. अशीच मूर्ती उमरगा येथील शीव मंदिरावर देखील आहे. योगासनातील या विष्णुमूर्तीवर अलंकरण अतिशय किमान दाखवलेले असते. मस्तकापाठिमागे प्रभावळ दिसून येते. याच मूर्तीला हातातील आयुधांच्या क्रमावरून "आसनस्थ केशव" असे संबोधन देगलुरकरांनी आपल्या संशोधनात वापरले आहे. गदेचा अपवाद वगळता बाकी आयुधांचा विचार केल्यास ते बरोबरही वाटते.
या योगमुद्रेतील मुर्तीचे बुद्ध मुर्तीशी साम्य चटकन डोळ्यात भरते. याच परिसरातील विष्णु मुर्तींवर दशावतारांचे अंकन दाखवत असताना ९ वा अवतार बुद्ध दाखवला जातो. औंढा येथील केशव मुर्तीवर तो दाखवलेला आहे.

शिव-हरेश्वराची मुर्ती, होट्टल :-

नांदेड जिल्ह्यात देगलूर तालूक्यात तेलंगणा सीमेवर होट्टल नावाचे गांव आहे. चालूक्यांची उप राजधानी असलेले हे गांव शिल्पवैभवाने अतिशय समृद्ध आहे. या  गावांतील दोन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला. आज याच मंदिरांच्या परिसरात होट्टल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे. एक हजार वर्षांपूर्वीची ही अतिशय समृद्ध अशी नगरी. जूने भक्कम दगडी वाडे आजही गावात आहेत. परिसरांतील २२ गावे ज्यांच्या देशमुखीखाली होती अशा तालेवार देशमुखाची प्रचंड गढी या गावात आहे. गढीची पडझड झालेली असली तरी प्रवेशद्वार आणि त्या भोवतीची भक्कम भिंत जून्या वैभवाची साक्ष देते.
     मुख्य महादेव मंदिराचे चिरे, नक्षीदार २० खांब, बाह्यांगावरच्या सूरसूंदरींची शिल्पे, नृत्य गणेशाचे अप्रतिम शिल्प यांचा शोध घेवून मंदिराचे बांधकाम परत करण्यात आले. स्थानिक पाथरवटांचे सहकार्य घेत रिकाम्या जागी त्याच आकाराचे दगड कलात्मकरित्या बसविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या इनटॅक्ट (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍण्ड हेरिटेज) संस्थेच्या सहकार्याने गुरूतागद्दी सोहळ्याच्या निधीतून या कामासाठी काही निधी उपलब्ध करून देण्यात आला.
   जिर्णाद्धार झालेली दोन मंदिरे पाहून एकीकडे पुरातन ठेव्याबद्दल अभिमान वाटत असतानाच समोर येते दुसरे भग्न मंदिर जमिनीखाली अर्धे गाडले गेलेले हे मंदिर आपल्या शिल्पवैभवाने एकीकडे पाहणार्‍याचे डोळ्याचे पारणे फेडते आणि परिसराची दुर्दशा बघून डोळ्यात पाणीही आणते.
    मंदिराच्या परिसरांत कित्येक शिल्पे विखुरलेली आहेत. काही शिल्पांभोवती उकिरडा साठला आहे. प्रातर्विधीसाठी लोक या जागेचा वापर करताना पाहून त्याच दगडांवर डोके आपटून घ्यावे अशी भावना दाटून येते. मंदिर परिसरांत दगडी बांधकाम असलेली बारव आहे. तिथे प्रचंड झाडी गवत वाढले आहे. पाण्याचा उपसा नसल्याने हिरवट शेवाळ्याचा थर साचला आहे. गाळ प्रचंड असल्याने पाण्याला दुर्गंधी येते आहे. निगराणी अभावी दगडी चिरे ढासळून गेले आहेत.
     पुरातत्व विभाग काय करतो आहे? किंवा लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी काय करत आहेत? या सोबतच आधी सामान्य नागरिक म्हणून आपण या पुरातत्वीय महत्त्वाच्या ठेव्याची अशी अवहेलना का करतो आहोत? हा प्रश्‍न सतावतो. या मंदिराच्या परिसराची किमान साफसफाई, कुंपण घालून त्याचे संरक्षण इतकी साधी गोष्ट आपणाला का जमत नाही?
     एक शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती गावात नालीच्या कडेला पडून आहे. हत्तीचे सुंदर शिल्प उकिरड्यावर लोळत आहे. होट्टल महोत्सव पाहण्यासाठी आलेला व्हिन्सेंट पास्किलीनी हा परदेशी फ्रेंच प्रवासी उपहासाने म्हणाला, ‘तूम्ही  भारतीय इतके श्रीमंत अहात की अप्रतिम अशी शिल्पे तूम्ही उकिरड्यार फेकून देता.’ आता या उद्गारावर काय प्रतिक्रिया द्यावी?
    ज्या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेला आहे तेथपासून ते जमिनीत गाडल्या गेलेल्या दुसर्‍या मंदिरापर्यंत सरळ असा दगडी मार्ग असल्याचे अभ्यासक सांगतात. रस्त्यात असलेल्या मानवी वस्तीचे अतिक्रमण काढले तर हा संपूर्ण मार्ग दृष्टीपथास येवू शकतो.
     आजही दगडी काम करणारे कारागीर येथे आहेत. त्यांची काम करण्याची तयारी आहे. त्यांचा तो पोटपाण्याचा उद्योग असल्याने गरजही आहे. मग या पाथरवटांच्या साहाय्याने ही कामं आपण का नाही मार्गी लावू शकत? निवेदनं द्या, प्रस्ताव तयार करा, मग सरकारी पातळीवर हालचाली होणार, सरकारी पातळीवरची उदासीनता हे सगळं असह्य आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना याची जाण जेंव्हा येईल तेंव्हा येईल पण आधी किमान आपण स्थानिक पातळीवर शक्य होईल ते काम केले पाहिजे. त्यासाठी गावकर्‍यांनी आधी पुढाकार घेतला पाहिजे. मंदिरांचा जिर्णोद्धार, परिसराची स्वच्छता, होट्टल पर्यंत येण्यासाठी पक्क्या चांगल्या रस्त्याचे निर्माण यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्मिती होईल. 

हरी—हर जूळ्या मुर्ती (वडगल्ली, परभणी) :-

हि मुर्तींवर  नानलपेठ, परभणी येथील जबरेश्वर महादेव मंदिरात आहे.फोटोत उजव्या बाजूची मुर्ती केशव विष्णुची आहे. औंढ्याच्या अशाच मुर्तीवर याच सदरात लिहिले आहे. डावीकडची मुर्ती "केवल शिव" या नावाने ओळखली जाते. या शिवाच्या वरच्या उजव्या हातात त्रिशुळ आहे. त्याचा दंडच शिल्लक आहे. खालचा उजवा हात वरद मुद्रेत आहे. त्या हातात अक्षय माला आहे. वरच्या डाव्या हातात सर्प आहे. खालच्या डाव्या हातात बीजपुरक आहे. जास्त बीज असलेलं फळासारखं दिसणारं हे सृजनाचे प्रतिक मानलं जातं. संहारक मानल्या जाणार्‍या शिवाच्या हातात सृजनाचे प्रतिक हे वेगळेपण आहे. समभंग अवस्थेत उभ्या शिवाच्या चेहर्‍यावर शांत भाव आहेत. औंढा नागनाथ मंदिरावर अशा सहा मुर्ती बाह्य भागात कोरलेल्या आहेत. मुर्तीच्या पायाशी नंदी आहे पण त्याचे मुख तुटले आहे. माणकेश्वर मंदिरावर पण केवल शिवाचे सुरेख शिल्प आहे.
जबरेश्वर महादेव मंदिरात नंदीच्या पाठीमागे या दोन मुर्ती कोनाड्यात ठेवलेल्या आहेत. मंदिर संपूर्ण नविन झालं आहे. पूर्वी मंदिरा समोर बारव होती ती आता बुजवल्या गेली. या दोन मुर्ती मुळ मुख्य मंदिरात कुठे बसवलेल्या असतील हे आता कळत नाही पण त्यांच्या एकसारख्या शैलीमुळे अगदी आजूबाजूला असतील हे सहज लक्षात येतं. जी महादेवाची पिंड आता गाभार्‍यात आहे ती स्वयंभु असून मंदिराची दूरूस्ती ६० वर्षांपूर्वी झाली तेंव्हा पिंड काढताच आली नाही. प्रचंड मोठ्या शिळेचा ती भाग होती. मग तिच्यावर आच्छादन टाकुनच दूरुस्ती केल्या गेली अशी लहानपणीची आठवण आई सांगते (आईचा जन्म १९४९). गाभार्‍यात हनुमानाची स्थापना भिंतीवर केली आहे. पण ही मुळ मुर्ती नसणार. मुळात हे जबरेश्वर (शिव) आणि जगदीश्वर (विष्णु) असे मंदिर असेल का? कारण या मुर्ती मंदिराच्या बाह्य भागातील वाटत नाही.

अनंतशयन विष्णु :-

पैठणच्या नृसिंह मंदिरातील ही देखणी मुर्ती. शेषशय्येवर विष्णु पहूडले आहेत. झोपले हा शब्द आपण चुकीने वापरतो, उजवा वरचा हात माने खाली घेतल्याने मान उंचावली आहे. ही अगदी नैसर्गिक सहज अशी अवस्था शिल्पकाराने रेखली आहे. नाभीतून निघालेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत. लक्ष्मी उजवा पाय चेपत आहे. डावा पाय घडी करून कासवाच्या पाठीवर टेकवला आहे. मुर्तीच्या पाठशिळेवर नक्षीत दहा अवतार कोरलेले आहे. शेषाचा फणा बरोबर चेहर्याला मध्यभागी कल्पुन समतोल साधत शिल्पांकीत केलेला दिसतो.

ही मुद्रा विश्वनिर्मितीचे प्रतिक मानली जाते. आपल्यातून सर्व विश्व निर्माण करून त्याकडे कौतूकभरल्या नजरेने भगवान पहात आहेत. पद्मनाभ विष्णुची जी शक्ती आहे तीला श्रद्धा म्हणतात. जगाची निर्मिती ही श्रद्धेतून झाली असंही मानलं जातं. लक्ष्मीच्या बाजूला हात जोडल्या अवस्थेत गरूड आहे.
सप्त फण्यांच्या शेषाच्या ९ वेटोळ्यांवर भगवान पहूडले आहेत. या सर्पाची त्वचा हूबेहूब खालच्या वेटोळ्यांवर दाखवत शिल्पकाराने कमाल केली आहे. (फोटो सौजन्य सुधीर महाजन)

अनंतशयन विष्णु

अनंतशयन असा हा अप्रतिम विष्णु मंदिराच्या बाह्य भागावर कुठे सहसा आढळत नाही. ही मूर्ती परभणीच्या क्रांती चौकातील राम मंदिरात आहे (टाकळकर कुटूंबियांचे हे मंदिर आहे).
उजव्या वरच्या हातावर मस्तक विसावलेले आहे. उजव्या पायाशी लक्ष्मी असून ती पाय चुरत आहे (याला पाय दाबणे म्हणत नाहीत). तिच्या बाजूला भुदेवी हात जोडून उभी आहे.  नाभीतून उगवलेल्या कमळावर ब्रह्मदेवाची प्रतिमा कोरलेली आहे. पाठशिळेवर दहा अवतार कोरलेले आहेत. खाली नागाच्या वेटोळ्यांची मउ शय्या आहे. डोक्याशी नागाचा फणा आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पाठशिळेवर कोरलेले अष्टदिक्पाल. कंसात दिशा आणि वाहन दिले आहेत.  इंद्र (पूर्व -ऐरावत)), अग्नी (अग्न-मेष) , यम (दक्षिण-महिष), निऋती (नैऋत्य-श्वान), वरूण (पश्चिम-मकर), वायु (वायव्य-मृग), कुबेर (उत्तर- नरवाहन) , ईशान (ईशान्य-वृष). शिल्पात त्यांची वाहने पण दाखवली आहेत. अभ्यासक या शिल्पाला फार महत्वाचे मानतात त्याचे कारणच ही वैशिष्ट्ये आहेत. बारवेत अशा शिल्पाची स्थापना केलेली असते.

शेषशायी विष्णु आणि समुद्रमंथन :-

ज्याठिकाणी बारवा, कुंड, पुष्करणी आहेत अशा जागी शेषशायी विष्णुचे शिल्प कोरलेले आढळून येते. हे शिल्प सहसा मंदिरावर नसते. मराठवाड्यातील प्राचीन बारवांमध्ये अशी शिल्पे आढळून आलेली आहेत. यातही हे शिल्प अजून वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या ठिकाणी समुद्रमंथनाचा देखावा शिल्पांकित केला आहे. गोसावी पिंपळगांव (ता. सेलु, जि. परभणी) येथील दूर्लक्षीत असे प्राचीन मंदिर, तेथील बारव या परिसरांत आमचे भटके पुरातत्व प्रेमी मित्र मल्हारीकांत देशमुख यांना हे शिल्प आढळून आले. शेषशायी शिल्पांवर दशावतार कोरलेले असतात, अष्टदिक्पालांच्या प्रतिमा असतात. पण इथे समुद्र मंथनाचा प्रसंग कोरलेला आहे.
देव आपल्या उजव्या बाजूला आहेत. त्यांच्या बाजूला वासुकीच्या शेपटाचा भाग आहे. दानव डाव्या बाजूला आहेत त्या बाजूला नेमका नागाचा फणा दाखवला आहे. जेणेकरून विषाची बाधा दानवांना व्हावी.
विष्णुचे पाय चुरणारी लक्ष्मी दिसत नाही. तो भाग भंगला आहे. बाकी शंख, चक्र, गदा ही आयुधं स्पष्टपणे ओळखु येतात.
असा शिल्पखजिना गावोगाव विखुरला आहे. गोसावी पिंपळगाव हे अडवळणाचे गाव. गावकर्‍यांनी मंदिर परिसर चांगला जपला आहे. अभ्यासकांनी अशा शिल्पांचा सविस्तर अभ्यास करून त्यांना प्रकाशात आणले पाहिजे. यातील शास्त्रीय बारकावे समोर आले पाहिजेत. ही विखुरलेली शिल्पे जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र आणून त्यांचे संग्रहालय झाले पाहिजे.
परभणी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील अभ्यासक, पुरातत्व प्रेमी, सामाजीक कार्यकर्ते यांची एक समिती नेमून या कामाला गती दिली आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !

लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती :-

औंढा नागनाथ मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर आहे तेंव्हा स्वाभाविकच शिवाच्या मूर्तींचे प्रमाण अधिक आहे. याच मंदिराच्या मंडोवरावरील ही एक सूंदर लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती लक्ष वेधून घेते.
विष्णुच्या हातातील गदा स्पष्ट दिसते. दूसर्‍या हातात काय आहे स्पष्ट दिसत नाही. विष्णुचा लक्ष्मीच्या कमरेवरचा डावा हात आणि लक्ष्मीचा विष्णुच्या खांद्यावरचा उजवा हात दिसतो. लक्ष्मीची उंचावलेली मान. तिच्या डाव्या हातात कमळाची कळी आहे. विष्णुला सखा मित्र सोबती मानणारी ही मूद्रा फार मोहक आहे. विष्णुचा उजवा पाय गुडघ्यात जरा वाकला आहे. लक्ष्मीचा डावा पाय असाच गुडघ्यात वाकुन मग खाली आला आहे. हा पाय भंगला असून परत खाली तळव्यापाशी जरा दिसतो आहे. तिच्या कानातले वर्तूळाकार कुंडल आणि त्यात परत एक फुल मोठं मोहक आहे. विष्णुच्या बाजूने खाली गरूड हात जोडून मांडी टेकवून बसला आहे. त्याचे पंख मागे दिसत आहेत.
आपल्याकडे "लक्ष्मी नारायणा" सारखा जोडा म्हणायची पद्धत आहे. या म्हणीचं हजार वर्षांपूर्वीचे हे शिल्पांकित देखणं दृश्यरूप. इथे दोघांची उंचीही जवळपास समान दाखवली आहे. विष्णु जरासा डावीकडे झुकलेला आणि लक्ष्मीही त्या बाजूने जराशी झुकलेली आहे. अतिशय लालित्यपूर्ण अशी ही मूद्रा आहे. त्याचा डावा आणि तिचा उजवा पाय ठामपणे जमिनीवर रोवलेले आहेत. तर विष्णुच्या उजवा तळव्याची बोटंच जमिनीवर टेकतात. लक्ष्मीचा डावा तळवाही असाच अधर आहे. चार पैकी दोन पाय भक्कम आणि बाकी दोन ललित या कल्पनेला दाद दिली पाहिजे. सुखी संसाराचे रहस्यच शिल्पकाराने मांडलय.
दोघांचेही चेहरे समोर असले असते तर हे शिल्प सपाट वाटले असते. पण लक्ष्मीच्या संपूर्ण मूर्तीला ३० अंशाचा जरासा कोन देवून शिल्पकाराने जो ३ डि परिणाम साधलाय त्याला तोड नाही. कमाल आहे.
लक्ष्मी नारायणाच्या स्थानक मूर्ती (उभ्या असलेल्या) फार कमी आहेत. याच मंदिरावर अशी अजून एक मूर्ती आहे. लोणारला दैत्यसुदन मंदिरावर पण एक आहे. पण ही सर्वात लालित्यपूर्ण.

विष्णुची वराह मूर्ती :-

मत्स्य, कुर्म या नंतर तिसरा अवतार वराह मानला जातो. वैष्णव मंदिरांवर वराह अवताराच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. ही वराहमूर्ती जाम (ता. जि. परभणी) येथील प्राचीन मंदिरावरची आहे. मुख वराहाचे व शरिर मानवाचे अशी स्थानक मूर्ती (म्हणजे उभी) या प्रकारातील हा नृवराह म्हणून ओळखला जातो. उजव्या खालच्या हातात गदा आहे. वरच्या हातात पद्म आहे. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे वरती कमळ फुललेले तर खालच्या बाजूस कळी आहे. डावा मुडपलेला हात आहे त्यावर लक्ष्मी विराजमान आहे. त्या हातात शंख आहे. डाव्या खालच्या हातात चक्र आहे. डावा पाय शेष नागाच्या फण्यावर टेकवला आहे. शिवाय कासवही या पायाखाली आढळून येते. मूर्तीला सुंदर अलंकारांनी मढवले आहे. शंख पकडला त्या हातात शंखाला पकडण्यासाठी सोन्याची साखळी गुंफावी असाही दागिना दिसून येतो. शंखाच्या खोबणीत बोटं बरोबर बसवली आहेत. शंख कसाही पकडला आहे असे नाही. उजव्या हाताची गदा ऐटदारपणे जमिनीवर रोवलेली आहे. सगळ्याच मूर्तीला एक छानसा डौल प्राप्त झालेला आहे. जामचे मंदिर वैष्णव मंदिर असल्याने विष्णुने सुंदर कलात्मक प्रतिमांचे अंकन यावर आढळून येते.

वेरूळ लेण्यातील वराह अवतार शिल्प :-

हे शिल्प वेरूळच्या लेणी क्र. १४ मधील आहे. या लेणीला "रावण की खाई" म्हणून ओळखले जाते. हिरण्याक्षाने वसुंधरेला समुद्रतळी नेले होते. विष्णुने वराह अवतार घेवून तिला वर काढले अशी कथा आहे.
नागाच्या आभोगावर, वेटोळ्यावर उभा असणारा वराह. एक पाय पुढे, एक हात कमरेवर. याला आढील आसन म्हणतात याला. काहीतरी जगावेगळा पराक्रम करून पृथ्वीला पाण्या बाहेर काढलेला आश्वासक आवेग जाणवतो इथे. पृथ्वी अतिशय मनापासून हुश्श म्हणून त्याला धन्यवाद म्हणत असावी इतकी सहज सुंदर आहे. तिच्या कानात असणारे एक कुंडल माने जवळ आहे तर दुसरे लांब आहे.
खाली बाजूला हिरणाक्ष आणि त्याची पत्नी हात जोडून उभ्या असलेल्या दिसतील. पाताळ, पाणी असणारा प्रदेश, इतर असंख्य गोष्टी आणि नाग देवता यांचे नाते सर्वश्रुत आहे.
इथे वराहाने धरलेले चक्र आणि पृथ्वीची त्रिभंग मूर्ती खूप महत्त्वाची. हातात चक्र नेमकेपणाने धरले आहै. महाभारत मालिकेत मध्ये नितीश भारद्वाज किंवा सगळे नर्तक धरतात तसे कधीही धरत नाहीत.
भुदेवीने आपला उजवा हात वराह मुखावर सहजपणे टेकवला आहे. तिच्या दूसर्या हातात कमंडलू दिसत आहे. पाठीमागे अर्धवर्तूळांतून समुद्र सुचीत केलेला आहे. वराह अवतार शिल्प मराठवाड्यात बर्याच ठिकाणी आढळून येतात.
वराह अवताराचे या प्रदेशातील हे सर्वात भव्य शिल्प आहे.

चंद्रपूरमध्ये खोदकामावेळी श्रीकृष्णाची मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती आढळून आल्यानंतर नागरिकांनी तिची पूजा केली. ही प्राचीन मूर्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. 
शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदणं सुरू होतं. सात फूट खोल खड्डा खोदून झाला होता. अन् काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होतं. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. मूर्तीला दुग्धभिषेक करत हात जोडले. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितलं. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स

 बालाजी मूर्ती :-

 

    ही सुंदर बालाजी मूर्ती चपळगावकर घराण्याची कुलदेवता आहे. कर्नाटका सीमेवर चपळगावकर ह्यांचे मूळ गाव आहे. वैष्णव कुटुंबात बालाजी कुलदैवत असते. विष्णूची नेमकी कोणती मूर्ती बालाजी व्यंकटेश ह्या नावाने संबोधली जाते? तर उजव्या वरील हातात चक्र वरील डाव्या हातात शंख, खालील उजवा हात वरद मुद्रेत आणि खालील डावा हात कटीवर. पुरीचा जग्गनाथ, तिरुपतीचा बालाजी आणि पंढरपूरचा विठ्ठल ही तीन मुळचे लोक दैवते. जग्गनाथ "अन्न ब्रह्म", बालाजी "कांचन ब्रह्म" आणि विठ्ठल "नाद ब्रह्म" म्हणून ओळखले जातात. व्यंकटेश बालाजीची आतिशय सुंदर आरती समर्थ रामदास यांनी रचिली आहे. ती बऱ्याच जणांना माहित नाही. इथे देत आहे. रा. चिं. ढेरे यांनी "श्रीव्यंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर" या आपल्या पुस्तकात दिली आहे. देवीचे नवरात्र असतात त्याच वेळी बालाजीचे ही नवरात्र असतात. त्याला ब्रह्मोत्सव म्हटले जाते. बालाजी आणि पद्ममावती विवाह सोहळाही ह्या काळात लावले जाते.

जय देव जय देव जय व्यंकटेशा
आरती ओवाळू तुज रे जगदीशा ॥ धृ०||
अघहरणी पुष्करिणी अगणित गुणखाणी ।
अगाध महिमा स्तवितां न बोलवे वाणी ॥
असंख्य तीर्थावळी अचपळ सुखदानी ।
अभिनव रचना पहातां तन्मयता नयनीं ॥ १ ||
अतिसुखमय देवालय, आलय मोक्षाचे ।
नाना नाटक रचना, हाटक वर्णाचे ॥
थकित मानस पाहे स्थळ भगवंताचे ।
तुळणा नाही हे भू-वैकुंठ साचे ॥ २ ||
दिव्यांबरधर सुंदर तनु कोमल लीळा ।
नाना रत्ने, नाना सुमनांच्या माळा ॥
नानाभूषणमंडित वामांगी बाळा ।
नाना वाद्ये मिनला दासांचा मेळा ॥ ३||

विठ्ठल मुर्ती :-


तुकाराम महाराजांनी "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" अशी ओळ ज्याच्याकडे पाहूनच लिहिली असावी अशी ही सुंदर विठ्ठल मुर्ती. सिंधुरवदन गणेशामुळे सर्व परिचित असलेल्या खाम नदीकाठच्या शेंदूरवादा (ता. गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर ) या गावात एका छोट्या लाकडी माळवदाच्या वाडा वजा मंदिरात ही मुर्ती ठेवलेली आहे. शिवकालीन संत मध्वमुनीश्वरांचे हे ठिकाण. इथे त्यांची समाधी आहे. जहागीरदार कुटूंबियांनी मध्वमुनीश्वरांचा आश्रम नक्षीदार कमानी दगडी ओवर्‍या असा भव्य बांधुन काढला आहे.
मध्वमुनीश्वर नियमित पंढरपुरची वारी करायचे. शरिर थकल्यावर त्यांनी विठ्ठलाला पत्र लिहिलं आणि येणं शक्य नाही असं म्हणत इथूनच नमस्कार केला. मग विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देवून मीच तूझ्याकडे येतो असं सांगितले. तीच ही विठ्ठल मुर्ती. दरवर्षी मध्वमुनीश्वरांचा उत्सव साजरा होतो तेंव्हा ही मुर्ती मिरवणुकीने मध्वमुशीश्वर आश्रमात नेली जाते.
      समचरण कर कटीवर ठेवलेले अशी ही काळ्या पाषाणातील देखणी मुर्ती. याच मंदिरात गरूडाचीही छोटी मुर्ती आहे. विठ्ठलाच्या प्राचीन सुबक देखण्या मुर्ती फार थोड्या आहेत. आणि ज्या आहेत त्या काहीश्या ओबडधोबड. शिवाय प्राचीन अशी विठ्ठलाची मंदिरेही फारशी नाहीत. पंढरपुर शिवाय पानगांव (ता. रेणापुर जि. लातुर) हाच एक ठळक अपवाद. हे प्राचीन विठ्ठल मंदिर शिल्प सौंदर्याने नटलेले आहे.
विठ्ठलाची मुर्ती एकटीच असते. सोबत रूक्मिणी नसते. अगदी पंढरपुरलाही रूक्मिणी मंदिर वेगळे आहे. यावर अरूण कोलटकर यांची वामांगी नावाची अप्रतिम कविता आहे. नंतरच्या काळात विठ्ठल रूक्मिणी यांच्या मुर्ती एकत्र तयार केल्या जायला लागल्या. या विठ्ठल मुर्तीचे पाय अतिशय देखणे आहेत. "पायावर डोकं ठेवणं" याला वारकरी संप्रदायात वेगळे महत्व आहे.

 एकनाथांचा विजय विठ्ठल

     कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात तर आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीनंतर देव निद्राधीन होतात. बरोबर ४ महिन्यांनी म्हणजेच कार्तिकी एकादशीला त्यांची निद्रा पूर्ण होते. हे चार महिने संत विद्वान अभ्यासक मंडळी पंढरपुरातच मुक्काम ठोकून ग्रंथांवर कुटचर्चा विचारविनिमय अभ्यास प्रवचन करतात.
सामान्य लोकांच्या दृष्टीने विचार केला तर हा काळा खरीपाचा म्हणजेच कोरडवाहू शेतीचा मोठा हंगाम असतो. शेतीची कामे असतात. कार्तिकी एकादशी तर पीक घरात येते. पुढचा रब्बीचा हंगाम सगळ्या शेतकर्‍यांसाठी नसतो. कारण मग ती पाण्यावरची म्हणजेच ओलीताची शेती असते.
    पैठणच्या नाथांच्या देवघरातला पुजेतला पांडुरंगाची हि मूर्ती. पांडुरंगाचे दोन्ही हात कटेवर ठेवलेले असतात. कानात मकर कुंडले. पायाखाली वीट असते. समचरण असा हा विठ्ठल उभा असतो. अहोबिल येथे प्राप्त झालेली विठ्ठल मूर्ती किंवा तिरूपती येथील मूर्ती अशीच समपाद असून डाव्या हातात शंख व उजवा हात वरद मूद्रेत आहे. पांडूरंगाला विष्णुचाच अवतार मानल्याने शंख त्याच्या हातात दाखवला जातो. पंढरपुरच्या मूर्तीचे दोन्ही हात कटीवर आहेत. डाव्या हातात ज्ञानाचे प्रतिक शंख व उजव्या हातात पावित्र्याचे प्रतिक पद्म आहे नाथांच्या पुजेतील मूर्तीही अशीच आहे. फक्त वरद मूद्रेतील उजवा हात वरच्या ऐवजी खालच्या बाजूला वळलेला आहे.
पंचधातूची ही दिडफुटाची मूर्ती वजनदार असून पायावर सोन्याचा पत्रा मढवला आहे.
आपल्या संत मंडळींनी पांडुरंगासाठी कितीतरी सुंदर अभंग रचले आहेत. पण प्राचीन काळातील आणि भारताच्या सर्व भागात उच्चारले जाणारे अष्टक म्हणजे शंकराचार्यांनी रचलेले पांडुरंग अष्टक "भजे पांडुरंगम" अतिशय प्रासादीक आणि गोड आहे.

  विजय विठ्ठल (हंपी, कर्नाटक)

कर्नाटकातील ही छोटी विठ्ठल मुर्ती मराठी माणसासाठी अस्मितेचे मोठे प्रतिक आहे. विजय नगरहून भानुदास महाराज (एकनाथांचे पणजोबा) यांनी विठ्ठल मुर्ती पंढरपुरला आणली अशी दंतकथा आहे. पण कर्नाटकांत हंपी येथे प्रचंड मोठे असे जे विजय विठ्ठल मंदिर आहे तिथे मात्र आता कुठलीच मुर्ती नाही. या मंदिर परिसरात जो अतिशय सुंदर दगडी रथ आहे त्यावर ही विठ्ठल मुर्ती कोरलेली मला आढळली. विठ्ठलाचा हा एक पुरावा. या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे खाली जी चाकं दिसत आहेत ती संपूर्ण फिरत होती. लोक सारखं फिरवून नुकसान करायला लागले म्हणून दगड लावून चाकांना स्थिर केले आहे. विठ्ठल भोळ्या भक्तांचा साधाभोळा देव आहे असं म्हणतात. पण इथे मंदिराचे प्रचंड मोठे आवार पाहून विठ्ठलाची "श्रीमंती" डोळ्यात भरते. मराठी माणसांनी पंढरपुर सोबत हंपीच्या विठ्ठल मंदिराची यात्रा केली पाहिजे. आपल्या विठ्ठलाचे ऐश्वर्य डोळे भरून बघितलं पाहिजे. साध्या पालखीतून आपण दिंड्या घेवून पंढरपुरला जातो पण याच आपल्या विठ्ठलाचा रथ किती राजेशाही होता हे बघितलं पाहिजे.
पंचेवीस तीस फुटीं उंच सलग असे दगडी खांब आणि तसलेच आडवे बीम वापरून जी भव्यता हंपीच्या मंदिरांना आलेली आहे ती विलक्षण आहे. अन्यथा इतक्या लांबीचे दगड कुठल्या जुन्या मंदिरामध्ये वापरलेले आढळत नाहीत. मंदिरातला गरूड खांब, हा भव्य रथ विठ्ठल विष्णुचाच अवतार समजला जातो याचा पुरावा दाखवतो. रथयात्रा ही प्रामुख्याने वैष्णव देवतांची निघते. महाराष्ट्राने पालखी हा रथाला शोधलेला वेगळा वैशिष्ट्यपूर्ण पर्याय आहे का? याचाही शोध घेतला पाहिजे. विठ्ठल हे दैवतच मुळात सनातन धर्मातील एक क्रांती आहे असं जाणवतं. या दैवतेला वाहन नाही, हीच्या हातात शस्त्र नाही, ही दैवता कोप पावून कुणाला शाप देत नाही की वरदान देत नाही. पुंडलीकाने फेकलेल्या वीटेवर कटीवर हात ठेवून उभी आहे. त्यामुळे भजनात रमलेला तुळशी माळ घातलेल्या वारकर्‍याच्या भोळ्या भक्तीत बुडालेला विठ्ठलच आपल्याला जवळचा वाटतो. विजयनगरचा विजय विठ्ठल अंतराने आणि रूपानेही दूरचा भासतो. आपल्याला काळ्या पाषाणातील विठ्ठलाचे "सावळे सुंदर" रूप पहायची सवय. त्यामुळे हा विठ्ठल वेगळा वाटतो. कुठे संगमरवरी दगडांत कुणी विठ्ठलाची मुर्ती घडवली तर मला नाही वाटत ती मराठी माणसाला आपलिशी वाटेल म्हणून. बहिणाबाईंनी त्यामुळेच लिहून ठेवलंय
सोन्या रूप्यानं मढला
मारवाड्याचा बालाजी
शेतकर्‍याचा विठोबा
पाना फुलांतच राजी
रा.चिं. ढेरे सारख्या अभ्यासकाने मांडले की पुरीचा जग्गनाथ, तिरूपतीचा बालाजी आणि पंढरपुरचा विठोबा ही मुळची लोकदैवतं नंतर विष्णुचे अवतार म्हणून स्विकारली गेली. जग्गनाथ "अन्नब्रह्म", बालाजी "कांचनब्रह्म" तर विठ्ठल "नादब्रह्म" मानल्या जातो. तुळशीमाळ गळ्यात घातलेला विठ्ठल आर्तपणे आळवलेल्या भजनानेच संतुष्ट होतो.

 हरीहरात्मक रुक्मिणी पांडुरंग मूर्ती, वेरूळ !

 एखादी मूर्ती स्वतःमध्ये शंकर विष्णू आणि पांडुरंग या तिघांचं जर तेज धारण करत असेल तर त्या मूर्तीच्या सौंदर्याची कल्पना करा.
आता सर्वप्रथम मूर्तीची माहिती आणि थोडासा इतिहास समजून घेऊया. ही मूर्ती वेरूळ इथल्या बारा ज्योतिर्लिंग पैकी घृष्णेश्वर मंदिराच्या एक किलोमीटरच्या अंतरावर टोपरे कुटुंबीयांच्या घराजवळ सुप्रतिष्ठित आहे. मूर्तीच्या दैनिक पूजेचे आणि सेवेचे सौभाग्य टोपरे कुटुंब गेली सातशे वर्ष सांभाळत आहेत. ही मूर्ती तिथे कशी आली याबद्दलची कथा त्यांच्याकडूनच ऐकायला मिळाली ती खालील प्रमाणे :
खूप पूर्वी सातशे वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला जमीन नांगरताना जमिनीत काहीतरी अडलं आणि काय आहे हे बघायला गेला तर जमिनीतून रक्ताची धार निघत असताना त्याला दिसलं. आजूबाजूची जमीन खणून मोकळी केल्यावर त्याला सदर मूर्ती नजरेस पडली. त्यावेळेस त्या गावांमध्ये मल्हार स्वामी म्हणून एक महाराज तपश्चर्या करत होते. शेतकऱ्याने त्यांना भेटून विनंती केली की मला शेतामध्ये नांगरताना अशी मूर्ती सापडली आहे आणि माझ्याकडनं तर तिची पूजा अर्चा होणे शक्य नाही तर तिला तुमच्या सानिध्यात आणून ठेवतो जेणेकरून तिची दैनिक पूजाअर्चा करणे सोपे होईल. महाराजांनी संमती दिली आणि शेतकऱ्याने त्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या गाडीवरती दोन बैल लावले आणि त्यावर ती मूर्ती उचलून ठेवली. पण दोन बैलांनी ती मूर्ती पुढे खेचली जाईना तेव्हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे चार बैल आठ बैल असं करत करत बऱ्याच बैलांची शक्ती वापरूनही ती मूर्ती काही हलेना. शेवटी परत महाराजांकडे येऊन त्या शेतकऱ्यांनी प्रसंग कथन केला आणि त्यांना शेतात येण्याची विनंती केली. महाराज मूर्ती सापडलेल्या शेतात आले आणि त्यांनी मूर्तीला हात जोडले आणि सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत चला. बाकी शेतकऱ्यांनी ती मूर्ती उचलून महाराजांच्या डाव्या खांद्यावर दिली आणि इतकी प्रचंड मूर्ती महाराजांनी एकट्याने उचलून त्यांच्या मठाजवळ आणून सुप्रतिष्ठित केली. नांगरताना झालेल्या जखमेचा व्रण आजही या मूर्तीवर दिसून येतो. सातशे वर्षांपूर्वी शेतात सापडली म्हणजे या मूर्तीचा मूळ किती जुना असेल यासाठी कल्पनेचाच आधार घ्यावा लागेल !
हरिहरात्मक रुक्मीणी पांडुरंग

मूर्तीबद्दल विवेचन करायचं झाल्यास तिचं नाव हरिहरात्मक रुक्मिणी पांडुरंग का असावं तर ह्याची दोन कारणं, एक म्हणजे मल्हार स्वामी यांनी स्वतः हे नाव या मूर्तीला दिलं आणि मूर्तीचे अलंकार त्याची आयुधं या सगळ्याचा विचार केला तर यामध्ये शंकर आणि विष्णूची आयुधं आढळून येतात. मूर्ती अष्टभुजा म्हणजे आठ हातांची आहे. प्रत्येक हातात आठ वेगवेगळी आयुधं दिसून येतात.
विष्णूच्या आयुधांबद्दल :
      विष्णूची आयुधं म्हणजे शंख चक्र गदा आणि कमळ. मूर्तीच्या उजव्या हातात गदा आणि कमळ आढळून येतात. गदा भलीमोठी असून त्यावर किर्तीमुख आणि मारुती कोरलेला दिसतो. मूर्तीच्या डाव्या हातात शंख आणि चक्र आढळते. शंखाच्या बनावटीवरून तो पांचजन्य शंख असल्याचे अंकित होते. पांडुरंगाच्या हातातही शंख दिसतो त्या अनुषंगाने ही पांडूरंगाची मूर्ती असल्याचा अंदाज बांधता येतो.
शंकराच्या आयुधांबद्दल :
      ह्या मूर्तीत शंकराची काही आयुधं आहेत पण ती सुस्पष्ट नाहीत. मूर्तीच्या उजव्या हातात सर्वात वरती तलवार / खड्ग सदृश्य आयुध तर उजव्या हातात पाठच्या बाजूला भाल्या सदृश्य आयुध आढळतं. डाव्या हातात वरच्या बाजूला टंक ( दोन्ही बाजूला त्रिशूळ ) सदृश्य आयुध दिसतं तर डाव्या हातात (शंखाच्या वरच्या बाजूस ) सर्प पकडलेला दिसतो. खड्ग, सर्प आणि टंक ह्या आयुधावरून शंकराची मूर्ती असल्याचा संदर्भ देता येतो.
बाकी मूर्तीला रुक्मीणी का म्हणतात हे मल्हार स्वामींनाच ठाऊक.
 मूर्तीची डावी बाजू
 मूर्तीची उजवी बाजू

 
बाकी एकंदर मूर्ती अत्यंत सुबक, आखीव रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे. हातात अंगठ्या, बाजूबंद इत्यादी अलंकार सुंदर कोरले आहेत. दगडावर वज्रलेप केला असल्यामुळे दगडाचा पोत ( texture ) कळू शकला नाही पण मूर्तीची प्राचीनता पाहून तिच्यावर होयसळ कलेची छाप असवी हे नक्की !


पुण्यातील विष्णू मंदिरे -

१) नवा विष्णू मंदिर - बाजीराव रस्त्यावर शनिपाराजवळ नातूबागेपाशी नवा विष्णू मंदीर आहे. सार्वजनिक काका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जोशी कुटुंबियांच्या मालकीचे हे मंदिर आहे.

२) बिजवर विष्णू मंदिर - शनिवार पेठेत वीर मारूतीशेजारी बापट कुटुंबियांच्या मालकीचे छोटे विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर १८३८ मध्ये स्थापन झाले.

३) कसबा गणपती मंदिराशेजारील केदारेश्वर बोळात पौरोहित्य करणाऱ्या कानडे कुटुंबियांचे खासगी विष्णू मंदिर आहे. हे मंदिर त्यांनी १९७४ मध्ये स्थापन केले.

४) शनिवार पेठेत रमणबाग चौकात माणकेश्वर विष्णू मंदिर आहे.

५) २९१, सोमवार पेठ येथे एक विष्णू मंदिर आहे.

६) लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग विष्णू मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे.

७) पर्वती टेकडीवर एक विष्णू मंदिर आहे.

८) पु. लं. च्या काही लेखात पुण्यात बायकी विष्णू मंदिर आहे असा उल्लेख आहे. याचा संदर्भ सापडत नाही.

विष्णुची शक्तीरूपे :-

लोकप्रिय वारसास्थळांना आजकाल पर्यटकांचा प्रचंड ओघ असतो. पण अनेकवेळा या स्थळांजवळच असलेल्या अनवट ठिकांणाकडे क्वचितच कोणाची पावले वळतात. अजिंठा या जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या पर्यटनस्थळाच्या वाटेवर असलेल्या अन्वा मंदीराला खुपच कमी लोक भेट देतात. मात्र एका कारणासाठी इथे नक्कीच भेट दिली पाहिजे, ती म्हणजे विष्णुच्या स्त्री-रुपातील मुर्ती !




 




अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) मंदिरावरील विष्णुची शक्तीरूपे विशेष आहेत. मुर्तीशास्त्र अभ्यासकांत या मंदिराची ओळखच त्यामुळे आहे. गर्भगृहाच्या बाह्यांगावर वैष्णव देवदेवता आहेत. मेघा, शांति, तुष्टी आणि लज्जा या मुर्ती विशेष उल्लेखनीय आहेत. डॉ.देगलुरकर यांच्या मते या सर्व मुर्तींचा विचार केला तर हे मंदीर वैष्णव आहे. मंडपाचे छत घुमटाकार ( करोटक वितान ) असून टोकाकडे जाईल तसे ते निमुळते होते. हे शिखर वर्तुळाकार वलयांनी बनलेले आहे. घुमटाकार छताच्या सगळ्यात वरच्या बाजुला कमळाची नक्षी आहे. भारतीय परंपरेत पुजेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे रंगभोग आणि दुसरा अंगभोग. धुप दिप वस्त्र फुले गंध अक्षता या सगळ्याला अंगभोग म्हणतात. तर रंगभोग म्हणजे गायन वादन नृत्य. मंडपाच्या रचनेवरून येथे रंगभोग पद्धतीने पुजा होत असावी. याला पुरावा म्हणजे गायन वादन करणारे भक्त या मंदिरावर कोरलेल्या शिल्पांमधून दिसून येतात. अशीच शिल्पे होट्टल आणि धर्मापुरी येथेही आढळून आलेले आहेत. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय सुंदर नाजूक असे मुर्तीकाम केलेले आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूच्या शक्ती रूपातील म्हणजेच स्त्रीरूपातील मुर्ती. अशा मुर्ती फारशा कुठे आढळून आल्याची नोंद नाही. विष्णूची शंख, चक्र, गदा व पद्म ही चारही चिन्हे या मुर्तींच्या चार हातात आहेत. त्या स्त्रीरूपात दाखविल्या म्हणजे त्या मूर्ती लक्ष्मीच्या नाहीत. यांना विष्णूची शक्ती असे संबोधले गेलीे आहे. अन्वा मंदिरावरील विष्णुची शक्ती रूपातील शिल्पे भारतीय मूर्तीशास्त्राला मोठे योगदान आहे असे अभ्यासक मानतात. २४ पैकी १७ शक्ती रूपाच्या मुर्ती आजही अन्वा मंदिरावर शाबूत आहेत. अभ्यासकांनी जाणकार पर्यटकांनी त्या आवर्जून नजरेखालून घालाव्यात. विष्णुच्या हातात आयुधांचा जो क्रम आहे त्या प्रमाणे जी नावे दिली आहेत व त्या सोबत शक्तीची जी नावे आहेत त्याचा तक्ता अभ्यासकांसाठी देत आहे. पद्म, गदा, शंख, चक्र यांच्यासाठी प-ग-श-च ही लघु नावे वापरली आहेत. हा क्रम प्रदक्षिणा मार्गाप्रमाणे आहे. १. केशव-किर्ती (पशचग) २. नारायण- कांती (शपगच) ३. माधव - तुष्टी (गचसप) ४. गोविंद - पुष्टी (चगपश) ५. विष्णु - ध्रती (गपशच) ६. मधुसुदन - शांती (चशपग) ७. त्रिविक्रम - क्रिया (पगचश) ८. वामन - दया (शचगप) ९. श्रीधर - मेधा (पचगश) १०. ऋषिकेश - हर्षा (गचपश) ११. पद्मनाभ-श्रद्धा (शपगच) १२. दामोदर-लज्जा (पशगच) १३. वासुदेव-लक्ष्मी (गशपच) १४. संकर्षण - सरस्वती (गशपच) १५. प्रद्युम्न - प्रीती (चशगप) १६. अनिरूद्ध - रती (चगशप) १७. पुरूषोत्तम - वसुधा (चपशग) १८. अधोक्षज - त्रायी (पगशच) १९. नरसिंह - विद्युत (चपगश) २०. अच्युत - सुगंधा (गपचश) २१. उपेंद्र - विद्या (शगचप) २२. जनार्दन - उमा (पचशग) २३. हरी - शुद्धी (शचपग) २४. श्रीकृष्ण - बुद्धी (शगपच) (संदर्भ : Temple Architecture and Sculpture of Maharashtra - Dr. G.B. Deglurkar - page no. 362) ( इंग्रजीत ही यादी आहे. संस्कृत उच्चार वेगळे असतील तर कृपया चुक लक्षात आणून द्या. वामन आणि अच्युत शक्तींची नावे क्रिया आणि दया अशीही दिलेली आहेत. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा. त्रिविक्रम विष्णुचा आयुधक्रम मुळ पुस्तकात चुकला आहे. तो इथे दूरूस्त करून दिला आहे)

विष्णुचे शक्तीरूप - लक्ष्मी :-

हातातील आयुधे शंख चक्र गदा आणि पद्म यांचा जो क्रम आहे त्यानुसार विष्णुची २४ नावं आहेत. या २४ नावांसाठी २४ शक्ती आहेत. यातील उजव्या बाजूने म्हणजेच प्रदक्षिणा क्रमाने गदा, शंख, चक्र आणि डाव्या खालच्या हातात पद्म अशा विष्णुला वासुदेव संबोधले जाते. या छायाचित्रात याच क्रमाने आयुधे धारण केलेली जी स्त्री प्रतिमा आहे तीला लक्ष्मी असे संबोधले जाते (देवता म्हणून असलेली लक्ष्मी मूर्ती वेगळी). या मूर्तीचे शास्त्रा प्रमाणे केलेले विश्लेषण वेगळे. पण एक ललित कलाकृती म्हणूनही ही लोभस वाटते. उजवा हात ज्या पद्धतीने गदेवर टेकवला आहे, त्याचे लालित्य आणि गदेच्या सरळपणावर तोललेला सर्व शरिराचा भार, दूमडलेला उजवा पाय आणि रोवलेला तिरका डावा पाय, कमरेपासूनचे वरचे सर्व शरिर ९० अंशात फिरवून समोर आणले आहे जेंव्हा की पायाची दिशा वेगळी आहे. गदेच्या वरच्या टोकावर टेकवलेला पंजा हाच संपूर्ण शिल्पाचा तोल सांभाळणारा मध्यबिंदू जाणवतो.

विष्णुचे शक्तीरूप - शांती :-

सोबतच्या छायाचित्रात जे शक्तीरूप आहे त्याच्या हातातील आयुधांचा क्रम उजव्या खालच्या हातात चक्र, वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात पद्म आणि डाव्या खालच्या हातात गदा असा आहे. अशा विष्णुला मधुसूदन संबोधले जाते. मधुसूदन विष्णुच्या या शक्तीरूपाला शांती म्हणतात. (देगलुरकरांच्या पुस्तकांत santi असे लिहिले आहे. सांती असाही याचा उच्चार होतो. शास्त्राप्रमाणे मुर्ती कोरल्यावर शिल्पकाराने पुढे जावून जो कलाविष्कार घडवला आहे तो विलक्षण आहे. चक्र असलेला हात आणि गदेवरचा हात यात नृत्याची मुद्रा वाटावी असा समतोल आहे. शंख व पद्म धारण केलेल्या हातांची बोटे विलक्षण कलात्मक अशी वळवलेली आहेत. दोन्ही पाय दूमडलेले वक्राकार आहेत. डाव्या पायाचा तळवा संपूर्ण मुडपून समोरच्या बाजूला दिसतो आहे. गदाही सरळ नसून तिरपी आहे. कानातील कुंडले चक्राच्या आकाराची आहेत. गळ्यात एक हार मानेजवळ तर दूसरा दोन वक्षांच्या मधुन कलात्मकरित्या खाली ओघळला आहे. ठाम सरळ रेषा शिल्पात कुठेच नाही. अगदी बाजूच्या नक्षीतही नाही. मुर्तीच्या बाजूचे दोन उभे भक्कम स्तंभ जन्म आणि मृत्युचे प्रतिक मानले तर बाकी सगळ्याच शिल्पात लालित्य भरून राहिले आहे. कदाचित जन्म आणि मृत्यु या दोन बिंदूमध्य लालित्यपूर्ण आयुष्य जगले तर "शांती" लाभते असंही शिल्पकाराला सुचवायचे असेल.

विष्णुची शक्ती रूपे - सरस्वती :-

अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावर विष्णुची शक्तीरूपे शिल्पांकीत आहेत. छायाचित्रातील मूर्तीच्या हातात प्रदक्षिणा क्रमाने (डावीकडून उजवीकडे, घड्याळ्याच्या काट्या प्रमाणे) गदा, शंख, पद्म आणि चक्र अशी आहेत. या विष्णुला संकर्षण म्हणून संबोधले जाते. प्रतिभाशक्ती किंवा वाणी ही संकर्षण विष्णुची वैशिष्ट्ये मानली जातात. स्वाभाविकच या विष्णुची जी शक्ती आहे तिला सरस्वती हे नाव आहे. वीणा पुस्तक धारिणी म्हणून ज्या सरस्वती देवतेची पुजा होते ती सरस्वती वेगळी. ही केवळ शक्ती रूप आहे. या शक्तीच्या चेहर्‍यावर शांत भाव आहेत. प्रतिभेच्या पाठिशी बळ असावे लागते. नुसती दूबळी प्रतिभा कामाची ठरत नाही. संकर्षण विष्णुला बलाची देवता मानले जाते. साहजिकच त्याची शक्ती असलेली सरस्वतीही सामर्थ्यवान समजली जाते. ज्या प्रतिभेच्या पाठिशी सामर्थ्य आहे तिथे स्थिरता येते. आणि त्या स्थिरतेतून समाधान. म्हणूनच ही मुर्तीच्या चेहर्‍यावरील भाव शांत समाधानी दिसून येतात.
ही अतिशय वेगळी अशी स्त्री रूपातील मूर्ती अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील मंदिरावरची आहे. आता महादेव मंदिर म्हणून ओळखलं जात असलेलं हे मुळचं विष्णु मंदिर. शंख चक्र गदा पद्म यांचे चारी हातातील स्थान पाहून विविध नावे विष्णुला दिली जातात. अशी २४ नावं विष्णुची आहेत. त्यातील वरच्या उजव्या हातात चक्र, वरच्या डाव्या हातात शंख, खालच्या उजव्या हाती पद्म आणि खालच्या डाव्या हातात गदा असेल तर त्याला जनार्दन असे नाव आहे. दू:ख हरण करणारा असा हा जनार्दन. या विष्णुची शक्ती म्हणून जिचे वर्णन केले जाते ती म्हणजे उमा. ही त्या उमा शक्तीची मुर्ती आहे. ही विष्णुची पत्नी लक्ष्मी नव्हे. कुठल्याही देवतेच्या उजव्या बाजूला जी स्त्री प्रतिमा कोरली जाते ती त्याची शक्ती असते. (आई, मुलगी, बहिण, सुन या नात्यातील सर्व स्त्रीयांची जागा उजव्या बाजूस असते) डाव्या बाजूला असते ती पत्नी (वामांगी). या अभ्यासामुळे अन्वा मंदिरांवरील विष्णुच्या शक्तींचा दृश्य पुरावा समोर आला. डाॅ. देगलुरकरांच्या पुस्तकात यावर विस्तृत विवरण आहे. विष्णुची २४ नावं आणि त्यांच्या शक्ती सांगितल्या आहेत.
सालकम चेरुवू (गाव) सिंगनमला (मंडल) अनंतपूर जिल्हा आंध्रप्रदेश.

वैष्णव शिल्पात अर्धनारी रूप :-
    विष्णुचे हे अर्धनारी रुप दुर्मिळ असून याला सत्य वेणुगोपाला म्हणून ओळखले जाते.  १६ व्या शतकातील विजयनगर काळात नरकासुर संहाराची कथा लक्षात घेऊन ही कलाकृती एका महान शिल्पकाराची निर्मिती केली. अनंतपूर जिल्हा पुरातत्व संग्रहालयातर्फे हे शिल्प जवळच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासारखे  अनेक प्रयत्न करूनही गावकऱ्यांनी स्थलांतर करण्याची इच्छा नसल्यामुळे ते अयशस्वी झाले. मात्र काही वर्षांपूर्वी एका गुन्हेगाराने त्या दुर्मिळ मूर्तीला उचलून नेले. हे शिल्प एखाद्या मौल्यवान रत्नापासून बनलेले असेल अश्या समजुतीतून ते तोडले आणि असे दुर्मिळ शिल्प नष्ट झाले. 











ARDHANARI FORM IN VAISHNAVITE SCULPTURE.

SALAKAM CHERUVU (village) SINGANAMALA (Mandal ) ANANTAPUR DISTRICT  ANDHRAPRADESH.

One of the rarest life sized stone sculpture in ARDHANARI FORM IN VAISHNAVITE identified by me in 1995 as SATHYA VENUGOPALA . It was the creation of a great sculptor during the VIJAYANAGARA period of 16 th  Century C.E period keeping in view of the theam of NARAKASURA SAMHARA . Despite of my so many efforts like shifting of the sculpture to the near by District Archaeological Museum  ANANTAPUR failed because of the villagers non-willingness  for shifting. Next I tried to make the village head one Mr. Raghavendra Reddy as INTACH ( INDIAN NATIONAL TRUST FOR ART AND CULTURAL HERITAGE) an NGO Organisation as a LIFE MEMBER IN ANANTAPUR DISTRICT  CHAPTER but all these steps were in-vaine and some four years  back some unknown culprits LIFT away that rare idol with an intention that this sculpture is made of JADE Stone a semi precious stone and with their greediness they broken away and destroyed such a rare sculpture once for all. It is a pity thing and couldn't be digestible.







आग्नेय आशियातील विष्णुमूर्ती...

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

आग्नेय आशियामध्ये शंकरासोबतच विष्णूची उपासना किमान दीड हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती, हे तेथील शिलालेख आणि मूर्तींच्या पुराव्यांवरून लक्षात येते. त्यातील काही मोजक्या आणि महत्त्वाच्या मूर्तींची ओळख आजच्या लेखात करून घेणार आहोत.

आपल्या देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कुशाण राजवंशाच्या काळातील (आजपासून सतराशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती आढळलेल्या आहेत. त्यानंतर आलेल्या गुप्त राजवंशाच्या काळातील (आजपासून सोळाशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती मध्य प्रदेशातील उदयगिरी लेण्यांत किंवा मथुरा इथे सापडल्या आहेत. या आपल्या देशातल्या प्राचीन विष्णुमूर्ती आहेत. याच काळात शैव आणि वैष्णव पंथ आताच्या भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून आग्नेय आशियातील थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये पोहोचले. भूतलावरील राजा हा सृष्टीचे पालनपोषण करणाऱ्या विष्णुसमान किंवा विष्णूचा अवतार आहे ही भारतीय संकल्पनासुद्धा आग्नेय आशियातील या देशांमध्ये दिसून येते.

थायलंड : आग्नेय आशियात सापडणाऱ्या सर्वांत प्राचीन विष्णुमूर्तींपैकी एक विष्णुमूर्ती आपल्याला थायलंडमध्ये सापडते. दक्षिण थायलंडमधील चैय्या इथे सापडलेली ही विष्णुमूर्ती भारतातील कुशाण आणि गुप्त राजवंशाच्या काळातील मूर्तींशी साम्य दाखवणारी आहे. इसवीसन चौथ्या/पाचव्या शतकात म्हणजे आजपासून सोळाशे ते पंधराशे वर्षांपूर्वी ही मूर्ती तयार करण्यात आली होती.

ही मूर्ती चतुर्भुज विष्णूची आहे. या मूर्तीत विष्णूच्या मस्तकावर किरीट असून कानात मोठी कुंडलं आहेत. मूर्तीचा मागील डावा हात तुटलेला असून मागील उजव्या हाताने गदा धरलेली आहे. पुढील उजवा हात अभय मुद्रेत असून पुढील डाव्या हातात शंख धरलेला आहे. अशा पद्धतीने कमरेपाशी शंख धरलेल्या भारतातील कुशाण राजवंशाच्या आणि गुप्त राजवंशाच्या काळातील विष्णुमूर्ती उत्तर भारतात आढळून आलेल्या आहेत.

काही अभ्यासकांच्या मतानुसार चैया येथील ही विष्णुमूर्ती म्हणजे आग्नेय आशियातील आता उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन विष्णूमूर्ती आहे. इसवीसनाचे चौथे शतक किंवा पाचवे शतक या दरम्यानच्या कोणत्या काळात ही मूर्ती घडवण्यात आली असावी, याबद्दल अभ्यासकांत मतमतांतरे आहेत. काही असले तरी भारतातील विष्णुमूर्तीचा प्रचंड प्रभाव असणारी ही आग्नेय आशियातील महत्त्वाची मूर्ती आहे, हे नक्की. याशिवाय थायलंडमध्ये इतरही अनेक ठिकाणी विष्णूमूर्ती सापडल्या आहेत. थायलंडमधील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील तेथील शैव आणि वैष्णव पंथांचा प्रभाव तेथील हिंदू मंदिरे आणि देवतांच्या मूर्तींवरून लक्षात येतो.

कंबोडिया : कंबोडियातील सोळाशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखांतूनसुद्धा विष्णुमंदिरांना दिलेली दानं नमूद केलेली आहेत. त्या काळातील काही विष्णुमूर्तीदेखील सापडल्या आहेत. मात्र विष्णुभक्तीचा कळस आपल्याला अंकोरवाट नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मंदिरात बघायला मिळतो. हे मंदिर कंबोडियातील सूर्यवर्मन (दुसरा) या राजाने बाराव्या शतकात बांधलं. तेथील शिलालेखांत या राजाचे नाव परमविष्णुलोक असे नोंदलेले आहे. या मंदिरातील समुद्रमंथनाचे शिल्प अत्यंत प्रसिद्ध आहे. समुद्रमंथनाच्या या शिल्पात कुर्मावतारासह विष्णूची मूर्तीदेखील पहायला मिळते.

या मंदिराशिवाय अंकोरच्या परिसरात थोम्मानन, बांते सम्रे इत्यादी विष्णुमंदिरं आढळून येतात. या सर्व मंदिरांवरील शिल्पांमध्ये आपल्याला विष्णू, राम, कृष्ण यांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधित कथांची शिल्पं कोरलेली आढळतात. कंबोडियामध्ये विष्णूच्या दगडी शिल्पांखेरीज ब्राँझच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत. यातील आठशे वर्षांपूर्वीची गरुडारूढ विष्णूची एक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. कंबोडियातील अनेक मंदिरांच्या भिंतीवर आढळणाऱ्या गरुडारूढ विष्णूच्या दगडी मूर्तींसमान ही ब्राँझची मूर्ती घडवलेली आहे.

व्हिएतनाम : मध्य आणि दक्षिण कंबोडियातील वैष्णव पंथाचा प्रभाव व्हिएतनाममध्येदेखील पडला होता. त्यामुळे व्हिएतनाममध्येदेखील इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून विष्णुमूर्ती निर्माण केल्या जात होत्या. येथील एका विष्णुमूर्तीच्या वरील दोन हातांत शंख आणि चक्र दिसून येते. तर खालील डावा हात हा गदेवर ठेवलेला आहे. या मूर्तीत विष्णूचे कुरळे केस दाखवले असून मस्तकावर किरीट आहे.

ही विष्णुमूर्ती साधारणपणे तेराशे वर्षांपूर्वीची आहे. या मूर्तीच्या अंगावर कोणतेही दागिने कोरलेले नाहीत. त्या काळी कंबोडिया, व्हिएतनाम येथील मूर्तींना कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने घातले जात असत, हे तेव्हाच्या शिलालेखांवरून समजते. व्हिएतनाममधील या मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध आणि सुरेख पद्धतीने घडवलेल्या आहेत. व्हिएतनाममधील मी सन या प्राचीन शैव तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शेषशायी विष्णूची मूर्तीदेखील सापडली होती, याबद्दल आपण व्हिएतनामवरील एका लेखात बघितले आहे.

इंडोनेशिया : इंडोनेशियातील प्राचीन हिंदू मूर्तींमध्ये काही विष्णुमूर्तीदेखील आहेत. इंडोनेशियातील जावा बेटावर सापडलेल्या विष्णुमूर्तींपैकी एका मूर्तीवर वर उल्लेख केलेल्या थायलंडमधील चैय्या येथील मूर्तीचा प्रभाव आहे. तर येथेच सापडलेल्या दुसऱ्या एका विष्णुमूर्तीत अधिक कोरीव काम केलेले आढळून येते. या चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा घेतलेली दिसून येते. या मूर्तीच्या मस्तकावर कोरीव किरीटमुकुट घातलेला आहे. या मूर्तीच्या कमरेच्या वस्त्रावरील चुण्यादेखील अत्यंत बारकाईने दाखवलेल्या आहेत. ही मूर्ती अंदाजे इसवीसनाच्या पाचव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली होती, असे अभ्यासकांचे मत आहे. या सुरुवातीच्या काळातील विष्णुमूर्तींखेरीज इतरही विष्णुमूर्ती इंडोनेशियामध्ये सापडतात. इंडोनेशियातील प्रंबानन येथील अकराशे वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या प्रसिद्ध मंदिरसमूहात एक विष्णुमंदिरदेखील आहे.

इंडोनेशियातील दीड हजार वर्षांपूर्वीच्या पूर्णवर्मन नावाच्या राजाच्या एका शिलालेखाशेजारी दोन पावले कोरलेली आहेत. ही पावले त्रिविक्रम विष्णूची असल्याचे तसेच पूर्णवर्मन राजा हा विष्णुसमान असल्याचे त्या शिलालेखातून नमूद केलेलं आहे. भूतलावरील पूर्णवर्मन राजा हा विष्णूचा अवतार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न राजाने या शिलालेखातून केलेला आहे.

आग्नेय आशियातील मोजक्याच विष्णुमूर्तींबद्दल माहिती करून देण्याचा प्रयत्न या लेखातून केलेला आहे. परंतु आग्नेय आशियातील या विविध देशांमध्ये विष्णूच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. अगदी शैवपंथाइतका नसला तरी वैष्णवपंथाचा प्रभाव आग्नेय आशियातील या देशांमध्ये होता हे तेथील विष्णुमंदिरे, शिलालेख आणि मूर्तींवरून लक्षात येते.

(सदराचे लेखक सांस्कृतिक वारसा अभ्यासक आहेत.)


















 






 






श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!




आहे.










































































































































































































१८. सुरसुंदरी (भाग १)



पुणे






































































































































































 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...