Tuesday, January 2, 2024

कोल्हापुर परिसरातील मंदीरे

 https://www.facebook.com/udaysinh.rajeyadav.1
री क्षेत्र बालिंगे येथील श्री कात्यायनी देवी स्थान.
श्री कात्यायनी मंदिर अमृतकुंड तील कासव.
श्री कात्यायनी मंदिर येथील श्री महालक्ष्मी शिळा स्थान
श्री परशुरामेश्वर शिवपिंडी.
श्री कात्यायनी मंदिर अमृतकुंड येथील शिवपिंडी.
अमृत कुंडातील एका बाजूला असणाऱे शिवपिंडी स्थान.
श्री यल्लमा मूर्ती.
श्री कात्यायनी मंदिर अमृत कुंडा शेजारी असणार्या पादुका.
श्री कात्यायनी मंदिर मंडप येथील इलेक्ट्रिकल नगारा.
कात्यायनी मंदिर श्री क्षेत्र बालिंगे येथील अमृत कुंड.
श्री कात्यायानी मंदिर अमृत कुंडातील कासव.
श्री परशुरामेश्वर महादेव शिवपिंडी.
श्री कात्यायनी मंदिर मंडप येथील नगारा.
श्री क्षेत्र कात्यायनी बालिंगे येथील मंदिरा पाठीमागून वाहणारा ओढा.
श्रीक्षेत्र बालिंगे कात्यायनी येथील श्री परशुराम मंदिर.
श्री कात्यायनी मंदिर बालिंगे येथील अमृत कुंड.
श्री कात्यायनी मंदिर येथील श्री हनुमान मंदिर.
श्री क्षेत्र बालिंगे येथील कात्यायनी देवी मुर्ती.
मंदिरासमोरील दीपमाळ.
श्री कात्यायनी मंदिर श्री क्षेत्र बालिंगे.
श्री यल्लमा मंदिर श्रीक्षेत्र कात्यायनी बालिंगे.
श्री कात्यायनी मंदिर येथील श्री भैरव मुर्ती.
श्री क्षेत्र कात्यायनी येथील श्री नारायण स्वामी तपस्थान.
 
 श्री परशुरामेश्वर ;- दक्षिण काशी,क्षेत्र करवीर, कोल्हापूर येथील प्राचीन स्थान महात्मे लाभलेले श्री क्षेत्र कात्यायनी मंदिर येथील श्री परशुरामेश्वर-महादेव मंदिर. कोल्हापूर गारगोटी रोडवरील कळंब्याहुन पुढे फाट्यावरून लगतच्या रस्त्यावरच कोल्हापूर पासून नऊ किलोमीटर अंतरावर पुराणकालीन निसर्गरम्य व रमणीय असे श्री कात्यायनी देवी चे मंदिर असून ते लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.हे श्री कात्यायनी मंदीर म्हणजे श्रीदेवी बरोबरच दुर्वास, परशुराम तीर्थ-क्षेत्र ही आहे, तसे संदर्भ प्राचीन ग्रंथ "करवीरमहात्म्यस्थतीर्थ देवता"या ग्रंथामध्ये आढळून येतात. यातील एकाव्या अध्यायामध्ये कात्यायनी, दुर्वास, कात्यायनी समीप सलींग परशराम तीर्थ असे संदर्भही आढळून येतात. याचबरोबर "श्री करवीर यात्रानुक्रम श्री महालक्ष्मी प्रीत्यैभवतु श्रीः" या प्राचीन ग्रंथात ही "श्री दक्षिणद्वारवासिनी कात्यायनी ययौःतत्र कात्यायनी दैव तःत्पूर तः अमृतकूंडं देत्याग्रतः भैरवः दैवी निकटे। सलींगंपरशुरामतीर्थ तत्र अमृत कुंडे स्नातवः देवी भैरवां पूज्यं अग्ने गधन् ऋषी कात्यायनी नंदा पुरात त्रीमागेसतीर्थ कोलभैरवंस अस पूज्य क्षेत्र नैॠत्ये विद्यमान नंदापुर मागतः"असे संदर्भ आढळून येतात. श्री देवी महात्म्य सप्तशती ८,९,१० व्या अध्यायात श्री कात्यायानी देवी चे वर्णन असून अकराव्या अध्यायात अग्नी व इंद्रादी प्रमुख देवतांनी तिची स्तुती केली आहे.श्री महालक्ष्मीच्या विविध रूपांपैकी तिचे हे एक रूप आहे आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करण्याकरता तिचा अवतार आहे. श्री कात्यायनी देवीची ख्याती पद्मपुराण करवीर खंडात नारद मार्कंडेय संवादातील व्यास मुनींनी रचलेल्या करवीर महात्म्याच्या सेहचाळीसाव्या अध्यायात केली असून तिचे वर्णन या ग्रंथात केले आहे. करवीर क्षेत्राच्या रक्षणासाठी असुरांनी चार दिशांना चार दूत ठेवले होते. त्यापैकी दक्षिण द्वारे रक्षण रक्तबीज नावाचा असूर करीत होता. त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी श्री महालक्ष्मीने भैरवाची योजना केली. भैरवाने रक्तबिजावर अनेक अस्त्र सोडली,पण त्या अस्त्रांमुळे त्यांच्या शरीरातुन रक्त निघे त्यातून असंख्य राक्षस निर्माण होत व ते भैरवास वेढा देत. तेव्हा भैरवाने श्री कात्यायनी देवी चा धावा केला. देवी कात्यायनी प्रगट झाली.आणि तिने रक्तबीजांचा वध करून अमृत कुंडातील जलाने मृत्त देवगण जिवंत केले. त्या ठिकाणी देवी स्थिर झाली. भैरवाने तिच्यापुढेच वास करून तिची स्तुती केली. श्री कात्यायानी देवी महात्म्य ऐकून परशुराम तेथे पापक्षालनासाठी आले. त्यावेळी त्यांनी अमृत कुंडात स्नान करून देवीची व भैरवाची पूजा केली. तेव्हा देवीने त्यांना सांगितले की या ठिकाणी तुम्ही आपल्या नावाचे तीर्थ करावे. हे तीर्थ आज ही देवी मंदिराच्या मागे पहावयास मिळते. श्री नारायण स्वामी यांना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीने श्री कात्यायनी कडे जाण्याचा आदेश दिला. श्री नारायण स्वामीनांही येथेच देवीचा साक्षात्कार होऊन ते नरसोबावाडीस गेले. येथे त्यांचेही स्थान आहे.श्री कात्यायानी देवी मूळची स्वयंभू शिळा असून तिची उत्सव मूर्तीही येथे आहे. मंडपात उजव्या हाताला भैरवाची मुर्ती आहे. त्यांचे प्रारंभी दर्शन घेऊन नंतरच देवीचे दर्शन घ्यावयाचे भैरव अनुजा असा प्रघात आहे. सकाळी मूर्तीवर स्नान,अभिषेक, पूजा असे उपचार केले जातात. सायंकाळी आठ वाजता शेजारती होते. मंगळवार हा देवीचा वार असून तिला दररोज दहीभाताचा मुख्य नैवेद्य दाखवला जातो.मंदिरात तुपाचा नंदादीप अहर्निश तेवत असतो. नवरात्र उत्सवात दररोज देवीची निरनिराळी पूजा उत्कृष्ट पद्धतीने बांधली जाते. तसेच असंख्य भक्त नवरात्रात नवरात्र उपावासासाठी बसत असतात.प्रत्येक पौर्णिमेस तीर्थप्रसाद व अमावस्येला होमहवन, महाप्रसाद व कार्तिक अमावस्येला होमहवन महाप्रसाद तसेच कोजागिरी व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होतात.स्नान महात्म्य मुळे सध्या या ठिकाणी संत मंडळींचे, शैक्षणिक सहलीचे तसेच परदेशी पर्यटकांची ही आगमन होत असते.मंदिर व मंदिर परिसरामध्ये भक्त भाविकांच्या सक्रिय सहकार्यामुळेच सध्या येथे नवनवीन सुधारणा करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.अगस्त्य आणि लोपामुद्रा सुद्धा या स्थळी येऊन गेले आहेत. येथील निर्भय आणि स्नेहःपूर्वक वातावरण पाहून लोपामुद्रा यांना आश्चर्य झाले होते .यावेळी अगस्तीनी लोपामुद्रा यांना येथील स्थान महात्म्य वर्णन केले आहे. भगवान परशुरामांनी क्षत्रिय वधाचे पथकातून मुक्त होण्यासाठी अमृत कुंडा मध्ये स्नान केले तसेच कात्यायनी देवीला प्रसन्न करून घेतले,असेही संदर्भ करवीर माहात्म्य कथासार,दक्षिणकाशी कथासार यामध्ये आढळून येतात.येथील कात्यायनी देवी चे स्वरूप स्थान म्हणजे शेंदूर लावलेले स्वयंभू शिळा स्वरूपातील मुर्ती स्थान आढळून येते.भैरव,अमृत कुंडातील देवता, श्री परशुरामेश्वर,अमृत कुंडा काठीचे श्रीचरण, नारायण स्वामींचे तपश्चर्या स्थान पाच बाय पाच दगडी कट्टा व पादुका, मारुती मूर्ती अशी स्थाने म्हणजे कात्यायनी देवी चे परिवार देवता आहेत. हा सर्व परिसर निसर्गरम्य घनदाट झाडी चे असल्यामुळे श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज, आक्कासाहेब महाराज आदींसह कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजघराण्यातील व्यक्ती शिकारीसाठी येथे हमखास भेटी देत. या देवीच्या दर्शनाला ही मंडळी सातत्याने येत असत.आजच्या काळातही हा निसर्गरम्य परिसर पहावयास मिळतो. खळखळत्त्या पाण्याचा झरा, झाडाझुडपातून वाट काढत वाहताना जुन्या काळातील भौगोलिक संरचना काय असेल याची प्रचिती येते.बालिंगे गावच्या मुख्य रस्त्यावरच हे श्री कात्यायनी मंदीर आहे. प्रशस्त मंदिराचा परिसर भव्य असून चारी बाजूंनी आर.सी.सी. ओवऱ्या सदृश्य बांधकाम करून परिसराची शोभा वाढवली आहे. याच्या मधोमध प्राचीन जुन्या काळातील बारा बारा असे श्री कात्यायानी देवी चे गर्भगृह आहे. याला जोडूनच तीस बाय तीस असा असा चौकोनी दगडी एकपाकी मंडप आहे.याच्या समोर पन्नास बाय पन्नास आकाराचा दगडी निमुळत्या पायऱ्या स्वरूपात अमृतकुंड जलाशय लागतो. अध्यात्मिक महती सांगणारे हे तीर्थकुंड दोन्ही बाजूला पायऱ्या तर पूर्व पश्चिम बाजूला दगडी कोनाड्यात प्राचीन मूर्ती याच बरोबर दोन्ही बाजूस दोन शिव पिंडी आहेत. मंदिराच्या पाठीमागील बाजूस टेकडीवर हे श्री परशुरामेश्वर स्थान होते. याचबरोबर या अमृत कुंडात ही श्री परशुरामेश्वर स्थान दिसून येते. या श्री पिंडी सतत अमृत कुंडातील पाण्यामध्येच पहावयास मिळतात. तीर्थकुंड म्हणजे अध्यात्मिक, आत्मिक स्थान याच बरोबरच या कुंडामध्ये असणारे रंगीबिरंगी मासे,कासवे आणखीनच प्रसन्नता वाढवतात. या तीर्थ कुंडावर भोवती सुरक्षा कारणास्तव लोखंडी कठडे उभा करून या शेजारीच दगडी कट्टा स्वरूपात श्री नारायण स्वामींचे तपस्थानही आढळून येते. या शेजारी छोटी पण सुंदर दिपमाळ आहे. रस्त्यावरून मंदिरात येताना झाडाखाली दगडी कट्ट्यावर श्री मारुतीची मूर्ती त्या शेजारीच ही दीपमाळ आहे.श्री कात्यायनी मंदिराच्या शेजारी उंचवट्यावर शिळारूपात श्री महालक्ष्मीचे स्थानही दिसून येते.मंदिराच्या पाठीमागील बाजूस परशुराम तीर्थकुंड आहे.दगडी बांधीव पाच-सहा पायर्या उतरून खाली जावे असे सुंदर शैलीतील हे तीर्थकुंड आहे. येथे परशुराम मंदिर ही आहे.या सर्वास पत्र्याचे शेड मारून मंदिराचे स्वरूप दिले आहे. या शेजारी श्री यल्लमा देवीचे हे मंदिर आहे. येथून वाहणारा झरा नैसर्गिक वारसा आहे. प्राचीन नद्यांचे उगम स्थान या अमृतकुंड द्वारे पहावयास मिळते. कात्यायनी मंदिराशेजारील दगडी मंडपात एका बाजूला श्री भैरव यांचे प्राचीन मूर्ती आहे तर दुसर्या बाजूला बंदिस्त स्वरूपात चांदीची पालखी दिसून येते.लाईट वर चालणारे नगारा यंत्र तर अन्य नगारे प्लास्टिक खुर्ची वर ठेवलेले दिसून येतात. अध्यात्मिक महती सांगणारे ठिकाण असे म्हणत असताना आजच्या धावपळीच्या जगात शहरापासून अगदी जवळच असणारे निवांतपणा अनुभवण्याचे ठिकाण म्हणजेही हे श्री कात्यायनी मंदिर. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री कात्यायनी क्षेत्र बालिंगा येथील श्री परशुरामेश्वर -महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,कोल्हापूर- औरंगाबाद. मोबाईल नंबर-९३७०१०१२९३.
 










री कल्लेश्वर ;- दक्षिण काशी, क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले श्री क्षेत्र शिरोळ येथील श्री कल्लेश्वर-महादेव मंदिर. कोल्हापूर करवीर पासून शिरोळ हे साधारण पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरील गाव. जयसिंगपूर, श्री क्षेत्र नरसिंहवाडी या गावाहून साधारणता आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील गाव. शिरोळ हे तालुक्याचे मुख्य ठिकाण. तहसीलदार कार्यालय शिरोळ या कार्यालयाच्या रस्त्याच्या पलीकडील बाजूस सुमारे दहा एकराहुन अधिक जागेत पसरलेला भव्य श्री कल्लेश्वर तलाव लागतो. हा तलाव म्हणजे प्राचीन तीर्थकुंड असून या तीर्थकुंडात स्नान करून श्री कल्लेश्वर महादेवाचे दर्शन घेतले असता पुत्रपौत्रादी संतती लाभ वंशवृधी होते असे संदर्भ पुराण ग्रंथात आढळून येतात. नागांनी केलेली श्री महालक्ष्मी स्तुती,श्री महालक्ष्मीने दिलेले गरुडा पासून अभय वरदान तर करवीर क्षेत्रात मुक्त संचार करण्याचा वावर, नागांनी केलेली तीर्थयात्रा याचे सविस्तर वर्णन श्री करवीर महात्म्य, करवीर महात्म्यस्थतीर्थ देवता, करवीर श्रीमहालक्ष्मीप्रित्यमभवन्तु अशा प्राचीन ग्रंथांमधून आढळून येते. करवीर क्षेत्राच्या बाहेर चारी दिशांना एक एक याप्रमाणे चार श्रीधर आणि चार कल्लेश्वर अशी आठ विख्यात स्थाने आहेत असेही संदर्भ श्री करवीर माहात्म्य कथासार ग्रंथात आढळून येतात. यानुसार श्रीक्षेत्र कळे येथील कलेश्वर, श्रीक्षेत्र टोप येथील श्री कल्लेश्वर, श्रीक्षेत्र अब्दुल लाट येथील श्री कल्लेश्वर तर हे श्रीक्षेत्र शिरोळ येथील श्री कल्लेश्वर मंदिर. नागनाथ यांनी केलेली ही यात्रा करवीरच्या या अष्ट दिशांना तर बत्तीस शिराळा पर्यंत श्री नागराज जात असताना जिथे जिथे नागांचे विष पडले तिथे श्री नागनाथ, नागराज, नागठाणे, सिद्धेश, कल्लेश, महादेव स्थाने निर्माण झाली आहेत. शिरोळ हे कोल्हापूर संस्थानातील एका बाजूचे गाव-टोक. श्रीक्षेत्र नरसिंहवाडी, जयसिंगपूर ही प्रसिद्ध गावे सुद्धा श्रीमंत छत्रपती महाराज सरकार करवीर यांच्या अखत्यारीतील गावे असे असले तरी करवीर संस्थान ची मुख्य देवता श्री महालक्ष्मी उत्सवादी करता काही गावे राखीव ठेवली होती. दक्षिण काशी क्षेत्र महात्म्य असणारी ही गावे, गावचा वसूल, वर्षासने स्वरूपात श्री महालक्ष्मी संस्थांकडे जमा होत होता. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी चे नवरात्रोत्सव आदी साठी शिरोळहुन सालाबाद प्रमाणे वर्षासने जमा होत होती अशा अनुषंगाचे मोडी लिपीतील कागद पहावयास मिळतात. शिरोळ येथील श्रीक्षेत्र कल्लेश्वर हे प्राचीन स्थान महात्म्य असून कोटीतीर्थ, कपिलतीर्थ, लक्षतीर्थ याप्रमाणे तळ्याकाठी असणारे श्री कल्लेश्वर महादेव मंदिर म्हणजे श्री अनादी पुराण क्षेत्र आहे. प्राचीन जुन्या काळातील दगडी अवशेषांबरोबरच येथे शिलाहार आणि यादव यांच्यामध्ये घमासान लढाईचे प्रतीक असणारे विरगळ ही येथे दिसून येतात. शिलाहार राजा भोज आणि सिंघणदेव यांची खिद्रापूर येथे झालेली लढाई अद्वितीय मानली जाते.सिंघणाने मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ अनेक मंदिरे बांधली गेलेली आहेत. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरातील खुद्द मंदिर बांधकामातच सिंघणदेव राजाचा शिलालेख आढळून येतो. सिंघणाच्या झालेल्या घमासान लढाई च्या पाऊलखुणा आसपासच्या भागात ही उमटलेल्या दिसून येतात. शिरोळ येथे झालेली घमासान लढाई,योद्ध्यांना आलेली वीरगती दर्शवणारे विरगळ या श्री कल्लेश्वर मंदिरात पहावयास मिळतात.दोन कप्पे,तीन कप्पे, चार कप्पे अशा विविध प्रकारातील विरगळ येथे पहावयास मिळतात. योद्धा कैलासवासी झाला असे वरच्या कप्प्यातील अर्धवट विरगळही येथे दिसून येतात. मंदिरा शेजारी एक मोठ्या झाडाला चौकोन बांधीव दगडी कट्टा करून या कट्ट्यावर हे वीरगळ ठेवले गेले आहेत. तेथे काही भग्नावस्थेतील शिवपिंडी,श्री नंदी मूर्ती ही आढळून येतात. मंदिर जुने प्राचीन संपूर्ण दगडी असून मंदिरामध्ये गर्भगृह पंधरा बाय पंधरा तर नंदीमंडप वीस बाय तीस असे सर्वसाधारण मंदिराचे स्वरूप आहे.संपूर्ण मंदिर दगडी एक पाकी असून शिखरही विशिष्ट वेगळे असल्याचे पहावयास मिळते. मंदिरासमोर दोन फूट अंतर सोडून तीस बाय साठ अशा आकाराचा आर.सी.सी. एक मजली पर्यटक हॉल जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने उभा करण्यात आला आहे. जुन्या काळातील मंदिर, पर्यटक हॉल रंगरंगोटी डागडुजी करत मंदिर तसेच मंदिर परिसर खूपच सुंदर ठेवला आहे.या मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक-सिमेंट ठोकळे, सिमेंट बाकडी,पर्यटक हॉल समोर उभारलेली दीपमाळ, श्री भगवान शंकर महादेवांची ध्यानस्थ मूर्ती अशा बाबी साकारत मंदिर परिसर प्रसन्नदायी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्राचीन नागस्थान असल्याने येथे काही नागशिल्प ही आढळून येतात.येथे प्रणय नागाचे शिल्पही आढळून येतात. मंदिर परिसर आणि शेजारी असलेला कल्लेश्वर तलाव याची सांगड घालून निवांत पणा चा क्षण अनुभवताना सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवणे विलक्षण प्रसन्नदायी असते. धार्मिक पर्यटन स्थळाचा विकसन विचार करता श्री कल्लेश्वर तलाव तीर्थस्थानाचे चौपाटी स्वरूपात विकसन हा प्रस्ताव पुढे येऊन त्यालाही आता गती मिळत आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री करवीर महात्म्यस्थतीर्थयात्रा कम्रमालेतील प्राचीन स्थान लाभलेले श्री क्षेत्र शिरोळ येथील श्री कल्लेश्वर- महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव, कोल्हापूर-औरंगाबाद. मोबाईल नंबर -९३७०१०१२९३.
 
 
श्री नागनाथेश्वर महादेव मंदिर पाठीमागील बाजू
श्री नागनाथ महादेव मंदिर येथील श्री नंदी मूर्ती.
श्री नागनाथ महादेव मंदिर येथील शिवपिंडी तसेच श्री नागमूर्ती.
श्री नागनाथेश्वर महादेव मंदिर.
श्री नागनाथेश्वर महादेव मंदिर समोरील श्री नंदी मूर्ती.
श्री नागनाथ महादेव मंदिर.
श्री नागनाथेश्वर महादेव शिवपिंडी.
 श्री नागनाथेश्वर महादेव मंदिर शिखर रचना.
 
श्री नागनाथेश्वर ;- दक्षिण काशी, क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले नागाव येथील श्री महादेव मंदिर म्हणजे श्री नागनाथेश्वर महादेव मंदिर. नागाव.कोल्हापूर पासून पुलाची शिरोली मार्गे राष्ट्रीय महामार्गावरील दहा ते बारा किलोमीटर अंतरावरील गाव. महामार्गावरून दोन किलोमीटर अंतर रस्ता फाट्याने मुख्य गावात यावे लागते. गावच्या मधोमध दीडशे वर्षांपूर्वीचा गाव चावडी वाडा लागतो. या लगतच हे श्री नाग स्थान आहे. गावचे ग्रामदैवत हे श्री खणाई देवी असले तरी नागाचे विषकुंड स्थान यामुळेच गावाला नावही नागाव असे पडले आहे. करवीर महात्म्य या प्राचीन ग्रंथातील तेराव्या अध्यायात नागावर श्री महालक्ष्मी कशी प्रसन्न झाली याचे सविस्तर वर्णन आहे. नागांनी विविध स्तुतिस्तोत्रे गायिली.ती आजही म्हणली जातात.नागांनी देवीचे मनोभावे स्तवन केले. देवीचे साग्रसंगीत पूजन केले. गंध,अक्षता, धूप, दीप,पुष्प,बिल्वपत्रे, निरांजन,वस्त्रालंकार, सुगंधी द्रव्ये, सुवर्णपुष्पे, तांबुल आदींनी तिची पूजा केली.होमहवन केले. देवीची नम्र भावे प्रार्थना केली. हे श्री महालक्ष्मी देवी तुझ्या दर्शनाने आमचा जन्म धन्य झाला आहे.आता आम्हास कोणतेही दुःख नाही. तुझ्या क्षेत्रात निवास करण्यास अनुभूती मिळावी एवढीच आमची इच्छा आहे. परंतु अजूनही आम्हास गरुडा पासून भय आहे. त्या भयापासून तू आम्हास मुक्ती दे म्हणजे तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्हाला राहता येईल. कृपावंत झालेली श्री महालक्ष्मी देवी म्हणाली," हे नागानो महामुनी पराशर यांच्या संगतीने तुम्ही खरोखरी पावन झाला आहात.आज मी तुम्हाला गरुडाच्या भयापासून मुक्त करते.आज तुम्ही निर्भय झाला आहात. या क्षेत्राची तुम्ही आनंदाने यात्रा करा. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही रहाल त्या त्या ठिकाणी तुमची तीर्थ होतील. यात्रा मार्गात ज्या ज्या ठिकाणी तुमचे विष पडेल त्या ठिकाणी तुमच्या नावाची स्थळे होऊन प्रसिद्धीस पावतील". नाग नाथाचे विष पडले म्हणून म्हणून या गावास नागाव हे नामाभिधान प्राप्त झाले आहे. नागांनी या ठिकाणी राहून महादेवांचे नामस्मरण केल्यामुळे श्री शंकर प्रसन्न झाले ते नागास म्हणाले ' तु या क्षेत्री राहून महालक्ष्मी च्या कृपाप्रसादाने धन्य झाला आहेस. तुला काही उणे नाही तरी ही तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे तू इच्छित वर मागुन घे. ' नाग म्हणाले हे उमापती तू या ठिकाणी शैलाग्री निवास करावास. या गावातील गाव चावडी जवळ श्री नागनाथाचे मंदिर आहे.आणि यामंदिराशेजारीच हे श्री नागनाथेश्वर मंदिर आहे. गाव चावडी जवळील नागाचे स्थान असणारे प्राचीन श्री नागनाथ महादेव मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून वीस बाय दहा गर्भगृह तर वीस बाय तीस नंदीमंडप,तर कमळ पाकळ्या स्वरूपातील उंच शिखर,मार्बल फरशीसह चकचकीत असे आर.सी.सी. मंदिर उभारले आहे. गर्भगृहात सुंदर शिवलिंगासह दगडी नाग शिल्प प्रतिमा तर अन्य पितळी नागप्रतिमा दिसून येतात.येथील नंदी मूर्ती ही सुंदर आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर गावकरी, शेतकरी आपल्या शेतात पिकलेली पिके प्रथम देवास अर्पण करतात.आता सध्या ऊस शेती असल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतातील ऊस दसऱ्याला अर्पण करतात.नंदीमंडपात हे ऊस ठेवले जातात.नंतर ते प्रसाद स्वरुपात वाटले जातात. या मंदिरा शेजारी रस्त्यापलीकडे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. तर या नागनाथ मंदिर रस्त्याच्या मार्गावरच पाच-सहा घरे सोडल्यानंतर रस्त्याशेजारीच श्री नागनाथेश्वर मंदिर आहे. मंदिर हेमाडपंथी शैलीतील प्राचीन असून बारा बारा दगडी एकपाकी कासव पाठीचे शिखर असणारे आहे. मंदिराबाहेरील श्री नंदी मूर्ती ही खूप सुंदर आहे. जिल्हा परिषद,कोल्हापूर ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत परिसरात पेविंग ब्लॉक- सिमेंट ठोकळे बसवत,मंदिराची डागडुजी, सिमेंट ने दर्जा भरणे अशा बाबी करत परिसर सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरातील शिवपिंडी अतिशय कोरीव, सुबक, आकर्षक आहे. असे हे,दक्षिण काशी ,क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले नागाव येथील श्री नागनाथेश्वर- महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,कोल्हापूर -औरंगाबाद. मोबाईल नंबर ९३७०१०१२९३.
श्री कुकूटेश्वर महादेव देवालय.
श्री कुकूटेश्वर महादेव मंदिर येथील श्री नंदी मूर्ती.
श्री कुकूटेश्वर महादेव देवालय.
श्री कुकूटेश्वर महादेव मंदिर येथील दगडी चौरंगावर असणारी श्री कुर्म पादुका.
टाऊन हॉल बागेतील मुळांचे जाळे असणारे वृक्ष.
टाऊन हॉल बागेतील निसर्गरम्य झाडीत असणारे श्री कुकूटेश्वर देवालय.
श्री कुकूटेश्वर महादेव मंदिरासमोर असणारा शिलालेख.
श्री कुकूटेश्वर महादेव देवालया समोरील दगडी कट्टा बांधीव स्वरूपातील वृक्ष.
श्री कुकूटेश्वर महादेव शिवपिंडी.
 
 श्री कुकूटेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थानमहात्म्य लाभलेले टाऊन हॉल येथील श्री महादेव मंदिर म्हणजे श्री कुकूटेश्वर- महादेव मंदिर. कोल्हापुरातील टाऊन हॉल बाग हा करवीरकरवासियांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. विविध प्रजातीची झाडे- वृक्ष, पक्षी संपदा जपलेलं ठिकाण.कोल्हापूरच्या अतिप्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा दर्शवणारे ठिकाण म्हणजे ब्रह्मपुरी टेकडी. या टेकडीच्या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळालेल्या वस्तू संग्रहित स्वरूपात या टाऊन हॉल बागेत ठेवलेल्या आहेत. संस्थान कारकिर्दीत भव्य इमारत उभा करून कोल्हापूर वस्तुसंग्रहालय रूपाने आजही हे वस्तुसंग्रहालय नाममात्र शुल्क दरात पहावयास मिळते. पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन तसेच उद्यान विभाग यांच्या अखत्यारीत आज हा भाग असला तरी येथे प्राचीन धार्मिक स्थान महात्म्य दर्शवणारे शिवमंदिर ही दिसून येते. निसर्गरम्य झाडी आणि यामध्ये असणारे हे शिवमंदिर मनास विलक्षण गारवा देणारी अनुभूती देते. मोठमोठाले वृक्ष आणि त्यांच्या छायेत एकत्र येऊन सामाजिक आंदोलने, मोर्चेकरी, नाट्यकर्मी, रंगकर्मी अशा सर्वांसाठीच आपुलकीचे ठिकाण म्हणजे ही टाउनहॉल बाग होय. भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी ही स्थानिक क्रांतीकारकांना एकत्र येण्यासाठी ही बाग प्रेरणादायी ठरली होती. आणि या सर्वांसाठी प्रेरक ठरणारा कणा म्हणजे हे प्राचीन शिवमंदिर.जुने मंदिर हे खूपच मोडकळीस आल्याने श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज करवीर यांच्या कारकिर्दीत मे. विश्वासराव पाटील प्रेसिडेंट इलाखा पंचायत करवीर संस्थान करवीर यांनी सध्या दिसणारे हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर पंधरा बाय पंधरा आकारातील दगडी बांधीव असून शिखर चुनाभट्टी बांधकामातील कोरीव शैलीतील आहे.मंदिरा सभोवती सात फूट आकाराने पत्र्याचे शेड वजा मंडप आहे. यामध्ये मंदिरासमोर श्री नंदी मूर्ती विराजमान आहे. या मंडपासमोर अलीकडील काळात चाळीस बाय चाळीस आकारातील पत्र्याची शेड उभा करून मंडप उभा केला आहे. मधोमध एक मोठे वृक्ष त्याला दगडी कट्टा तेथेही समाधिस्थान पादुका असल्याने कोणी बसू नये म्हणून तिरकस सिमेंट लादीकट्टा बांधला आहे.येथे दगडी मोठ्या चौरंग आकारातील कूर्म स्वरूपातील पादुका स्थानही आहे. येथे अनेक दगडी शिल्प विखुरल्याच्या स्थितीत दिसून येतात. या झाडाच्या समोरच दीड बाय तीन फूट खांब आकारातील जुना शिलालेख आहे.पण तोही भगव्या रंगाने रंगवल्या मुळे दिसून येत नाही. या मडंपा सभोवती काडापा फरशी बसवुन कट्टा केल्यामुळे भक्तगण, निराधार, कष्टकरी या सर्वांसाठी थोडी उसंत मिळण्याचे ठिकाण बनले आहे. पुराण संदर्भ ग्रंथांचा विचार करता कोल्हापुरात कोटीतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ आहेत या प्रमाणेच हे ठिकाण म्हणजे यमतीर्थ आहे. असे हे दक्षिण काशी,क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले शिवमंदिर म्हणजे श्री कुकूटेश्वर- महादेव मंदिर.
 
श्री गयेश्वर मंदिर परिसरात आढळून येणारे दगडी शिल्प

श्री गयेश्वर मंदिरातील श्री महाविष्णू मूर्ती.
श्री गयेश्वर स्थान.
श्री गयाश्वर मंदिर येथील कोरीव खांब.
श्री गयेश्वर मंदिर
श्री लक्ष्मीनारायण मंदिर.
श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील श्री मूर्ती.
 
 श्री गयेश्वर - दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले, विविध प्राचीन धर्मग्रंथात उल्लेखित असलेले मंदिर म्हणजे श्री गयेश्वर मंदिर. कोल्हापुरातील सोमवार पेठ येथील देशभूषण हायस्कूल, दिशा डायग्नोस्टिक सेंटर समोरील मंदिर म्हणजे श्री गयेश्वर मंदिर होय. दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग येथून लक्ष्मीपुरीकडे जाताना पहिलाच फाटा असणारा रस्ता येथे रद्दी-कागद विक्रीची मोठी दुकाने आहेत. या शेजारीच हे मंदिर आहे. "करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता"या प्राचीन ग्रंथामध्ये ' गया पूर्व दिग्भागे फलगुतीर्थ सन्गिधौ गधाधर रुपो विष्णुः।तस्येव पूर्वतःविष्णुदं ' असे उल्लेख आढळून येतात. आता सध्या महानगरपालिकेने कदम वाडी भाग विकसित केला आहे. हा भाग म्हणजे श्री गयेश्वर तसेच रुद्रगया यासाठी राखीव ठेवलेली जमीन होती. या जमीनीतून येणाऱ्या उत्पन्नातून धार्मिक उत्सवाचा खर्च खर्ची पडत असे. तशा अनुषंगाचे संस्थानकालीन मोडी लिपीतील कागद वाचता आले. नंतरच्या काळात हे मंदिर श्री सारडा यांच्या आप्तजना कडे आले.आज श्री फल्गुलेश्वर मंदीर हे पहावयास मिळते.आज फल्गु नदी कोल्हापूरच्या इतिहासातून लुप्त झाली आहे. पण फल्गु नदी या क्षेत्रातून वहात होती असे उल्लेख आढळून येतात. जमीन सपाटीपासून पाच ते सहा फूट खाली असणारे हे मंदिर आज जुन्या काळातील स्थानमहात्म्य दर्शवते. काशी, गया आणि प्रयाग ही स्थाने मुक्तीस्थान असल्यामुळे अनेक महनीय व्यक्ती,साधू यांनी या स्थानी येऊन साधना केली आहे. या ठिकाणी येथे श्री गयेश्वर स्थाना बरोबर इथे काही दगडात कोरलेले पाय- पादुका आढळून येतात. गधाधारी श्री महाविष्णूची मूर्ती याच बरोबर येथे एक पाय विष्णूपदं तर एक-एक पाय- पादुका हे श्री जमदाग्नी, ब्राह्मण,अत्री, चंद्र, इंद्र, कश्यप, गरुड,गणेश, आहवनीय, गार्हपत्य, अग्नि,आदित्य, कार्तिकेय, ऋग्वेद ,यजुर्वेद, सामवेद,अथव्रण,अगस्त्य, गर्ग अशी पदकमले दर्शवली आहेत.बारा बाय बारा दगडी एकपाकी प्राचीन मंदिर आणि उंचीही जेमतेम तेवढीच. या मुख्य मंदिरा सभोवती सर्वसाधारण तीस बाय साठ आर.सी.सी. मंडपवजा एक मजली इमारत उभा केली आहे. या मडंपामध्ये कोटा फरशी बसवली असून या मंडपाच्या मधोमध असणाऱ्या या मंदिरात पाच-सह् पायर्या उतरून खाली जावे लागते. या मंदिरा शेजारीच दहा बाय दहा आकारातील श्री लक्ष्मीनारायणाचे खूप छान मंदिर उभा केले आहे. संगमरवरी दगडातील सुंदर श्री मुर्ती खूपच आखीव-रेखीव आहेत. सत्संग सेवा केंद्र, सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या रुपाने मंदिर परिसर खूपच सुंदर ठेवला आहे. या परिसरात जुन्या काळातील मंदिराचे कोरीव दगड आढळून येतात. हे दगडी शिल्प तसेच प्राचीन मंदिराचे खांब हे अप्रतिम कोरकीपणाची उदाहरणे आहेत. दक्षिण काशी क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान असून सुद्धा मुख्य रस्त्याशेजारी मंडप वजा इमारत आणि आत मध्ये लक्ष्मीनारायण मंदिर, श्री सत्यनारायण मंदिर एवढीच ओळख सद्यस्थितीत शिल्लक राहिली आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान लाभलेले श्री गयेश्वर मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,कोल्हापूर-औरंगाबाद, मोबाईल नंबर- ९३७०१०१२९३.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर पाठीमागील बाजू वृक्ष,वीरगळ.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर पाठीमागील बाजू समाधीस्थान.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर व चौक.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव शिवपिंडी.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव शिवपिंडी.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर प्रवेशद्वार.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिरातील श्री गणेश मुर्ती.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिरातील मुर्ती.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर गर्भगृह प्रवेश द्वार.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर छत हेमाडपंथी रचना.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिरातील श्री नंदी मुर्ती.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर.
श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिरातुन बाहेर पडण्याचा मार्ग.
री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर.
 
 श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर - कोल्हापुरातील शिवाजी पेठ,उभा मारूती चौक जवळील हे महादेव मंदिर म्हणजे प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले श्री लवणालयेश्वर महादेव मंदिर. लवण म्हणजे सुंदर.लवण+आलय = सुंदर भागातील मंदिर म्हणून लवणालय. याचबरोबर लवण म्हणजे धातूवर आम्लाची प्रक्रिया करणे. दुधापासून दही, दह्यापासून ताक आणि ताक- लोणी पासून तूप तयार होते ही प्रक्रिया आपणा सर्वांना माहित आहे. सल्फ्युरिक आम्ल प्रक्रियेतून झिंक सल्फेट प्राप्त होते. यानुसार कोल्हापूर नगरी जवळील हा भाग मीठ फुटलेली जमीन असा असण्याची शक्यता आहे. याच बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून या काळातील प्रगल्भता याचा नेमका उलगडा होत नाही. असे असले तरी प्राचीन ग्रंथ संदर्भानुसार लवण,लवणालय देव संदर्भ आढळून येतात. शिवाजी पेठेतील लोणार तीर्थ विरजंतीर्थ देव लवणालय देव असे ही संदर्भ आढळून येतात. दक्षिण काशी आणि उत्तर काशी या अनुषंगाने झालेली तुला ही" तत लवणालय तटाके तुलस्यादिवन"असे संदर्भ आढळून येतात. या तुलेमध्ये दक्षिण काशी क्षेत्र,करवीर हे क्षेत्र यवाधिक काशी किंचित वरचढ असे ठरले होते. येथे असणारे मुग्दलतीर्थ आणि विरजंतीर्थ असे छोटे तळे होते आणि या तळ्याच्या काठी हे श्री महादेव मंदिर होते. हेमाडपंथी प्राचीन मंदिर पंधरा बाय पंधरा दगडी एकपाकी असून छोट्या दगडी कमानीतून आत जावे लागते. या मंदिरासमोर दगडी बांधीव बनावटीचा सात बाय पंधरा आकारातील नंदीमंडप दिसून येतो. या नंदी मंडपात चार बाय तीन अशा छोट्या आकाराच्या दरवाजातून वाकून प्रवेश करावा लागतो असा दरवाजा आहे. या मंडपातील नंदी मूर्ती नंतरच्या काळात उचलून श्री महादेव मंदिर गर्भगृहात ठेवलेली दिसून येते. या मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीतील देवळीत सुंदर श्री गणेश मूर्ती आहे. या मंदिराच्या पाठीमागील बाजूस मोठे वृक्ष असून त्यास बांधीव कट्टा तयार केला आहे. या भागात यादवकालीन ऑइल पेंट ने रंगवलेले विरगळ दिसून येते. येथे काही शिवलिंग समाधी शिल्प दिसून येतात. श्री लवणालयेश्वर महादेव शिवपिंडी ही अतिशय प्राचीन असून पाचएक कड्याहून अधिक कडा या शिवपिंडी आहेत. या प्राचीन मंदिरासमोर ऐतिहासिक काळातील वीस बाय तीस आकारातील मंडप दिसून येतो. या उभा मारुती चौकानजीक भरगच्च वस्ती आणि या घराच्या पाठीमागील बाजूस या श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर मंदिर, मंडपाच्या रुपाने मोकळी जागा हे ओळखून येत नाही. उभा मारूती चौकाकडून मरगाई गल्ली,खंडोबा तालीम कडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर डॉक्टर राऊत यांच्या दवाखान्याच्या समोरील बाजूस पाच सहा फुटाच्या छोट्या बोळातून या मंदिराकडे जावे लागते.श्री महादेव भक्तगणांकडून श्री महादेव तरुण मंडळ प्रणित साळोखे ग्रुप कडून विविध सण उत्सव विधी साजरे केले जातात. मंदिरासमोरील मंडप म्हणजे शिवाजी पेठेतील व्यक्तींसाठी निवांतपणा चे ठिकाण बनले आहे.मंडपाच्या समोरील बाजू अलीकडील काळात दगडी तटबंदीने बंदिस्त केली असून छोट्या बोळातूनच मंदिर चौकात प्रवेश एवढीच वाट शिल्लक राहिली आहे. प्राचीन काळी हा भाग म्हणजे विरजंतीर्थ,मुग्दलतीर्थ असा भाग होता. एक छोटे तळे आणि या तळ्याकाठी असणारे श्री महादेव मंदिर अशी स्थिती होती. तिर्थाकाठी असणारे श्री महादेव मंदिर म्हणून या मंदिरात श्री मुदगलेश्वर महादेव मंदिर असे अनेक भक्तजन म्हणतात. प्रत्यक्षात श्री मुग्दलेश्वर हे स्थान श्री नरसिंह मंदिराशेजारी आहे. तसेच श्री महालक्ष्मी मंदिरातील ओवरीतही श्री मुग्दलेश्वर महादेव मंदिर आहे.हे श्री महादेव मंदिर स्थान म्हणजे श्री लवणालयेश्वर महादेव स्थान आहे. असे असले तरी अनेक भक्तगणांकडून मूग्दलेश्वर म्हणूनही हे गणले गेले आहे. प्राचीन कालखंडानंतर ऐतिहासिक कालखंडात हा सारा परिसर श्री रामचंद्र पंत अमात्य बावडेकर संस्थान गगनबावडा यांच्या अखत्यारीत होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून ते कार्यरत होते. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर राज्याचे प्रमुख हुकुमतपनाह म्हणून ही त्यांनी काम पाहिले.सर्व राज्याचे बंदोबस्तास फौजा जमा करून राज्य संरक्षण करण्याची चांगली तजवीज त्यांनी राखावी यास्तव त्यांच्याकडे गगनबावडा ही जहागीर चालली. पुढे या जहागिरीचे संस्थानात रूपांतर झाले. त्यांचे निवासस्थान वाडा हा या श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिरा शेजारी होता.सर्व राज्यातील दौलतीचा कारभार करावा व जमाबंदी चे लिहिणे, जमाखर्चाचे लिहिणे, मुतालिक- देशपांडे -देशमुख की ची पत्रे लिहिणे, कारणपरत्वे फौज घेऊन जाऊन राज्य स्थापन करावे अशी महत्वाची स्वराज्यातील जबाबदारी पंत अमात्य बावडेकरांकडे होती. काळाच्या ओघात संस्थाने नष्ट झाली.संस्थानिकांनी कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील निवासस्थानास पसंती दिली. यामुळे या भागातील मंदिराकडे दुर्लक्ष झाले आणि आता तर हा भागच भरगच्च लोकवस्तीचा भाग बनला आहे.यामध्ये हे श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर दडून गेल्या सारखीच स्थिती आहे. असे हे दक्षिण काशी, क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री लवणालयेश्वर-मुग्दलेश्वर महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव -कोल्हापूर,औरंगाबाद.मोबाईल नंबर- ९३७०१०१२९३.
श्री सोमेश्वर महादेव मंदिर मंडप आवार
श्री सोमेश्वर महादेव मंदिर समोरील बाजू
श्री सोमेश्वर महादेव मंदिरासमोरील श्री नंदी मूर्ती.
श्री सोमेश्वर -वडेश्वर महादेव शिवपिंडी
श्री सोमेश्वर महादेव मंदिर चौकटी वरील श्री गणेश मूर्ती
 
 श्री सोमेश्वर- वडेश्वर ;- जुना बुधवार पेठ येथील वीरशैव लिंगायत समाज येथील रुद्रभूमीत असणारे प्राचीन शिवमंदिर म्हणजे श्री सोमेश्वर- वडेश्वर महादेव मंदिर. जुन्या काळातील श्री वडेश्वर तीर्थाच्या पूर्वेस पाच बाणावर जीतिच्या ओढ्यावर दलित वस्तीच्या उत्तरेस शेतात हे लहानशा स्वरूपात मंदिर होते. मंदिर हेमाडपंथी शैलीतील बाराव्या शतकातील असून दहा बाय दहा दगडी एकपाकी एवढेच मंदिराचे स्वरूप. मंदिराच्या सभोवती दगडी चौथरा,खांबाचा आधार घेत नंदीमंडप उभारणी असे सर्व मिळून पंधरा बाय पंधरा आकारातील जुने मंडप मंदिर. अलीकडील काळात पंचवीस बाय पंचवीस असा आर.सी.सी. स्वरूपातील जोड मंडप उभा करत जुन्या-नव्याचा संगम साधत मंडप प्रशस्त केला आहे. जुन्या काळी समाजातील स्मशानातील महादेव अशीच या मंदिराची ख्याती होती. प्रेतात्मा, भूत, प्रेत, वेताळ या सर्वांचा या ठिकाणी वावर या मुळेच जुन्या ग्रंथात या ठिकाणाविषयी "ज्वाला जिव्ह नामको वेतालः क्षेत्रस्य पंचायतन संज्ञाविधीरूप " असे संदर्भ आढळून येतात. प्रेतात्मां चे ठिकाण पण शेवटीही श्री महादेवांमध्येच विलीन होतात म्हणून या भूमीला रुद्रभूमी असे म्हटले जाते.वीरशैव लिंगायत समाजातील एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर अंत्यविधी येथे केले जातात.या अंत्यविधी मध्ये पर्यावरण रक्षण ही प्रमुख भुमिका असते.वायू,जल प्रदूषण रोखणे यातून दफन प्रक्रिया याच बरोबर अलीकडील काळात समाजातील एखादी व्यक्ती लिंगैक्य झाल्यानंतर त्याच्यावर रुद्रभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. माती सावरण्याच्या दिवशी पाहुण्यांची गर्दी, दफन केलेली जागा शेणांनी सारवून गोमूत्र शिंपडण्याची रीत व त्या ठिकाणी नैवेद्याचा पडलेला खच हे नेहमीचे चित्र होते. कावळ्याने नैवेद्य शिवल्यानंतर काही नैवेद्य कुत्र्या व मांजरांच्या पोटात जाई. नंतर उर्वरित नैवेद्य कचराकुंडीत टाकून द्यावे लागत असे. यामुळे अन्नाची नासाडी होई शिवाय प्लॅस्टिक कचरा द्रोण, पिशव्यांच्या माध्यमातून होई यामुळे जुन्या रुढी परंपरा बदलत ज्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे केवळ त्याच्या कुटुंबाने एकच नैवेद्य शक्यतो फक्त दहीभात ठेवण्याची प्रथा सुरू केली आहे. अन्य पाहुणे यांनीही समाजातील जाणकारांचा आदर करत नव्या विचारांचा स्वीकार केला आहे. जुन्या नव्या विचारांचा संगम म्हणून श्री वीरशैव लिंगायत समाजाकडे पहिले जाते. माती, पंचमहाभूतातून मानवी शरीर जीवन मिळते आणि शेवटीही त्यामध्येच मिसळतो.पण हे जीवन जगत असताना लिंग अथवा श्री महादेवाच स्मरण ठेवूनच जगतो याचबरोबर शेवटी लिंगैक्य झाल्यावरही ईश्वरी स्मरण असे एक तत्वज्ञान इथे सामावलेले आहे. अंत्यसंस्कार विधीसाठी या रुद्र भूमीत काही जंगम -स्वामीं कुटुंब निवास करून राहिले आहेत. साहजिकच या श्री वडेश्वर- सोमेश्वर महादेव मंदिराची स्वच्छता,दिवाबत्ती,नित्यनियमित पूजा होते ही एक समाधानाची बाब. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री वडेश्वर- सोमेश्वर महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव, कोल्हापूर.मोबाईल नंबर -९३७०१०१२९३.
 
 
 श्री संगमेश्वर- श्रीक्षेत्र अनुगामिनी , कमंडलू तीर्थ ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री क्षेत्र अनुगामिनी , कमंडलू तीर्थ, संजीविनी आणि मयुरी नदीच्या संगम स्थानावरील श्री संगमेश्वर- महादेव मंदिर. शहराचे वाढते शहरीकरण ,नागरी लोकवस्तीच्या अतिक्रमणाचा विळखा यातून प्राचीन इतिहासाचा वारसा ही आठवणी,कागद- पुस्तकांपुरताच मर्यादित होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे हे संगमेश्वर मंदिर आहे.संजिविनी- मयुरी या कोल्हापूर नगरीच्या प्रमुख नद्यांपैकी नद्या होत्या हे आज सांगूनही पटणार नाही. या नद्यांचे ओढे नाल्यात रूपांतर, तर काही पात्र प्रवाहातच बदल याची उदाहरणे आहेत आणि आता तर लोकवस्तीचाच हा एक भाग बनल्यामुळे घनदाट झाडीतील, रान-शेतवटातील प्राचीन मंदिर ही ओळख पुसटशी होत चालली आहे.या क्षेत्राजवळ थोड्या अंतरावर दूधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला आहे. प्रति दिन सतरा दशलक्ष लिटर क्षमतेच्या या प्रकल्पात अनेक नाले येऊन मिसळतात. आज जरी हे नाले दिसत असले तरी प्राचीन काळातील अध्यात्मिक महत्व दर्शवणाऱ्या संजीवनी व मयुरी अशा नदी आहेत.आजच्या काळात या नद्या जशा नष्टप्रद केल्या आहेत अगदी त्याचप्रमाणे या नद्यांचे संगम स्थान तसेच संगम काठावर असणारे श्री महादेव मंदिर ही मोडकळीस, उद्ध्वस्त अवस्थेमध्ये होते. यामुळे हे प्राचीन मंदिराचे दगड,अवशेष शेजारीच असणार्या श्री अनुगामिनी मंदिर परिसरात ठेवले आहेत. दगडी चबुतऱ्यावर चार बाय चार एकपाकी मंदिर एवढेच मंदिराचे स्वरूप होते. अगदी या ठिकाणावर अगदी जुने मंदिर जसे होते तशाच पद्धतीने अलीकडील काळात श्री गोविंदराव दत्ताजीराव गायकवाड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करत नव्याने मंदिर उभारणी केली आहे.या मंदिरापर्यंत लोकवस्ती अपार्टमेंट चे जाळे येऊन पोचले असले तरी या शेजारीच असणारे श्री अनुगामिनी देवीचे मंदिर मात्र शेतवट परिसर,मोठमोठे वृक्ष,हिरवीगार शेती अशा वातावरणातच दिसून येते. अगदी दहा वीस वर्षांपूर्वी रंकाळा, जावळाचा श्री गणेश मंदिर मार्गे दगड- धोंड्यातून, घनदाट जंगलातून शहरापासून दूर एका बाजूला एकाद्या गावाला गेल्या प्रमाणे वाट काढत जावे लागत असे. ही श्री अनुकामिनी देवी म्हणजे कोल्हापूरची एक रक्षक देवता मानली जाते. करवीर क्षेत्र हे भक्ती मुक्ती प्रदायनी क्षेत्र आहे. यम देवतेपासून कोणतीही पिडा होऊ नये तसेच श्री महालक्ष्मीच्या आज्ञेवरून मुक्ती प्रदायनी रक्षक देवता मानली जाते. पाच फूट उंचीची सहा हातांची पायामध्ये असुर देवता महादेव असलेली भव्य मूर्ती इथे दिसून येते. बारा बारा बारा दगडी एकपाकी हेमाडपंथी शैलीतील मंदिर प्राचीनतेची साक्ष देते. मोठ्या वटवृक्षाखाली भगव्या रंगाने रंगवलेली दोन विरगळ ही इथे दिसून येतात. श्री म्हसोबा, श्री महादेव तसेच स्मृती समाधी पादुका ही येथील परिसरात आहेत. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी परिवार देवता मधील ही देवी असल्यामुळे "करवीर महात्म्यस्थतीर्थ देवता " या प्राचीन ग्रंथांमध्ये पुढील प्रमाणे वर्णन आढळते."अनुगामिनी देवी जत्रै व तस्याःपुष्ठतः मयुरी। पूरतः संजीवनी साऋष्यश्रंगाश्रमांतिके जातासती उत्तरे शानूगामिन्यो मध्ये उत्तर वाहिनी।तयोःउदक्कस्त संगमः॥. देवीच्या समोर यज्ञकुंड तसेच छोट्या स्वरूपात कमंडलू तीर्थ ही पहावयास मिळते. हे कमंडलू तीर्थ स्थान येथे रंकाळ्याहून येणारा पाण्याचा प्रवाह तसेच अन्य प्रवाह एकत्र येऊन दुधाळी मार्गे पंचगंगा या मुख्य नदीत मिसळत असे. आजच्या काळात या उपनद्यांचे स्थान अगदी नगण्य झाले आहे. असे असले तरी हा श्री अनुगामिनी देवी परिसर विलक्षण आनंददायी अध्यात्मिक प्रचिती देणारा आहे. असे हे प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले शहराच्या पश्चिमेस रंकाळ्याच्या उत्तरेस थोड्या अंतरावर असणारे तीर्थक्षेत्र म्हणजे श्री संगमेश्वर-महादेव मंदिर,श्री अनुगामिनी कमंडलु तीर्थक्षेत्र. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव, कोल्हापूर.मोबाईल नंबर- ९३७०१०१२९३.
 
श्री सिद्धिविनायक श्री गणेश
श्री संगमेश्वर महादेव मंदिर चौकटी वरील असणारी श्री गणेश मूर्ती.
श्री संगमेश्वर महादेव मंदिर येथील नवीन श्री नंदी मूर्ती.
श्री संगमेश्वर महादेव मंदिर.
श्री संगमेश्वर महादेव शिवपिंडी.
श्री संगमेश्वर महादेव मंदिर येथील जुनी श्री नंदी मूर्ती

श्री संगमेश्वर महादेव मंदिर.
श्री संगमेश्वर महादेव मंदिर आवारातील श्री सिद्धिविनायक श्री मुर्ती.
 
 श्री संगमेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र, करवीर येथील प्राचीन महात्म्य लाभलेले,रविवार पेठ पुलाच्या उजव्या बाजूस जिवंती- गोमती नदीच्या संगम काठावर असणारे मंदिर म्हणजे श्री संगमेश्वर-महादेव मंदिर. कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालय,उमा टॉकीज सिग्नल वरून पार्वती टॉकीज रस्त्यावरील रविवार पेठ पुलाच्या उजव्या बाजूस हे मंदिर आहे. दक्षिण काशी क्षेत्र नामावलीत असणारे हरिपूर, जिल्हा सांगली येथील श्री संगमेश्वर मंदिर कृष्णा-वारणा नदी संगमापासून बऱ्याच अंतरावर आहे. अगदी त्याच पद्धतीने जिवंती आणि गोमती नदी संगम स्थानापासून थोड्या अंतरावर हे श्री महादेव -संगमेश्वर स्थान आहे. श्री महालक्ष्मीची महती सांगणारे जुने प्राचीन ग्रंथ, पुस्तके यामध्येही येथील स्थान उल्लेख आढळून येतो. करवीर महात्म्य ,दक्षिणकाशी कथासार या ग्रंथातील एकोणतीसाव्या अध्यायामध्ये येथील संगम स्थानाचा उल्लेख दिसून येतो. अगस्ती आणि लोपामुद्रा यांनीही करवीर यात्रानुक्रमानुसार या स्थानी भेट दिल्याचा उल्लेख आढळून येतो. श्रीमंत छत्रपती महाराज सरकार करवीर यांचे सरदार सरज्योतिषी श्री.जोशीराव यांच्या अखत्यारीत हा सारा परिसर होता. सर जोशीराव घराण्याची मुख्य देवता श्री गणेश असून संस्थान कारकीर्दीत त्यांच्याकडे अठरा श्री गणेश-गणपती मंदिर होती. यापैकी प्रमुख मंदिर म्हणजे हे श्री सिद्धिविनायक मंदिर होय. जोशीरावांनी इतिहास कालखंडात या मंदिराची उभारणी केली.मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या मानाने दरवाजा खूपच लहान आहे. साधारणतः तीन बाय अडीच फूट एवढ्याच आकाराचा हा दरवाजा आहे. श्री गणेश मूर्ती ही बैठ्या स्वरूपातील असून चतुर्भुज आहे.मूर्तीच्या डाव्या हातातील मोदक हाताची बोटे टेकली असल्यामुळे श्रीगणेश प्रत्यक्षात मोदक भक्षण करत असल्यासारखे वाटते. मूर्ती वालुकामय दगडातील असून पूर्वाभिमुख आहे. मूर्तीच्या वर नागफणी असून मूर्ती नयनरम्य वाटते. ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मंदिरात इतर दोन छोट्या मूर्ती असून बाल गणेशाची एक छोटी मूर्ती तर शेषनाग अशी दुसरी मूर्ती आहे. शहराच्या पूर्वोक्त दक्षिणोत्तर वाहणाऱ्या जयंती नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे साक्षी सिद्धिविनायक मंदिर आहे.हे मंदिर मुख्य रस्त्यापासून काहीसे खालच्या बाजूला असून मंदिराच्या मुख्य मंडपात जाण्यासाठी पन्नास एक पायऱ्या उतरून जावे लागते. उमा आणि पार्वती टॉकीज च्या दरम्यान कोल्हापूर शहरातील अतिशय मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे. मंदिराशेजारून वाहणारी प्राचीन महात्म्य दर्शवणारी जयंती नदी पण याला ओढ्या-वड्या नाल्याचे स्वरूप देत प्राचीन संस्कृतीचा उणेपणा दाखवत ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर अशी नामावली रूढ झाली आहे. खरेतर हा परिसरच अध्यात्मिक महती दर्शवणारा आहे. जयंतीचे पाणी वाढून परिसरात येऊ नये म्हणून जयंती शेजारी भलीमोठी उंच भिंत उभा करून परिसर सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे या सिद्धिविनायक जुन्या दगडी मंदिरापुढे भव्य आर.सी.सी. आकर्षक स्वरूपाचा मंडप उभारणी केली आहे. या परिसरात असणारे मोठमोठे वृक्ष त्यांना केलेली कट्ट्याची दगडी बांधणी, सर्व परिसरात बसवलेली फरशी, रंगरंगोटी करत आवार स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या मंदिराचे व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती,महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात येते. मंदिर परिसरात श्री राधाकृष्ण,हनुमान आणि हे श्री संगमेश्वर महादेव मंदिर आहे. हे श्री महादेव मंदिर प्राचीन हेमाडपंथी बांधणीतील असून दहा बाय दहा दगडी एकपाकी आहे. मंदिराच्या चौकटीवर सुरेख स्वरूपात श्री गणेश मूर्ती आहे.मंदिर प्रदक्षिणा मार्ग तसेच समोर पत्र्याचे शेड स्वरूपात मंडप उभा करून याचबरोबर दगडी मंदिराभोवती संगमरवरी फरशी, परिसरातही फरशी, रंगरंगोटी, लोखंडी रेलिंग करत परिसर आणि मंदिर स्वच्छ-सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन काळातील मंदिर समोरील श्री नंदी मूर्ती जीर्ण झाल्यामुळे मंदिरासमोरील चबुतऱ्यावर नवीन श्री नंदी मूर्ती उभा केली आहे. यामुळे शेजारील आवारातच जुनी श्री नंदी ममूर्ती ठेवली आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील जयंती-गोमती संगमस्थान जिवंतिशेजारी रविवार पेठ पुलाच्या उजव्या बाजूस असणारे हे श्री संगमेश्वर-महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव, कोल्हापूर.मोबाईल नंबर ९३७०१०१२९३
 












 श्री कल्लेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन ग्रंथात नामोल्लेख असलेले स्थान महात्म्य देवता म्हणजे श्री कल्लेश्वर- महादेव मंदिर. श्री क्षेत्र कल्लेश्वर, अब्दुल लाट कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गाव. इचलकरंजी- कुरुंदवाड रस्त्यावरील हे एक समृद्ध गाव. कोल्हापूर ते इचलकरंजी साधारण तीस किलोमीटर अंतर आणि इचलकरंजी ते अब्दुल लाट हे जेमतेम बारा किलोमीटर अंतर. पंचगंगा आणि दुधगंगा नद्यांवरील अत्यंत समृद्ध,मनमोहक असलेले हे गाव. गावाला पौराणिक-प्राचीन इतिहास तसाच मध्ययुगीन इतिहास ही रंजक आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीस मुस्लिम राजवटीत अनेक गावे इनाम दिल्याची फारशी,मोडी कागदपत्रे पहावयास मिळतात. यामध्ये आदिलशाही सनदा पत्रामध्ये लाट हे गाव दिसून येते. अब्दुला नावाच्या प्रसिद्ध सुभेदारामुळे अब्दुल लाट ही नामावली तयार झाली आहे. पुढे छत्रपतींच्या राजवटीतही अब्दुल लाट या गावाहून श्री महालक्ष्मीस गावगना जमा करण्यात यावे अशी सनदा पत्रे आढळून येतात.जसे छत्रपती,आदिलशहा राजवटीतील संदर्भ आढळून येतात तसे यादव राजवटीतील ही संदर्भ दिसून येतात. कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक अशोक मानकर यांनी यावर संशोधनही केले आहे. मंदिरा शेजारील एका घराच्या भिंतीला उभा करून ठेवलेले उभट आकारातील शिल्प, लेख येथे दिसून येतात. ग्रामस्थ त्यांची देव म्हणून पूजा करतात. हा गधगळीचा शिलालेख आहे. या लेखाच्या वरील भाग तुटून खाली पडलेला असून या तुटलेल्या दगडावर गाढव तसेच स्त्री क्रोमी चे चिन्ह- चित्र कोरले आहे. हे स्त्री क्रोमी मैथुन शिल्प आहे. या गधगळीच्या डाव्या बाजूस सूर्य आणि उजव्या बाजूस चंद्र तर मध्यभागी श्री महादेवाची पिंडी आहे. देवगिरी सम्राट राजा सिंघणदेव याचा इथे कन्नड शिलालेख पाहावयास मिळतो. श्री कल्लेश्वराला स्मरण करून लेख वर्णन आहे. मंदिरासमोर खांब स्वरूपातील दगडी दिपमाळ आहे तर पेविंग ब्लॉक-ठोकळे फरशी बसवत परिसर सुशोभित करण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरून तटबंदी आत मध्ये मोठा मोकळा परिसर आणि आतील मंदिर ही भव्य दगडी मंदिर असा एकंदरीत हा परिसर आहे. मुस्लिम काळातील कमानी, घुमटाकृती आकारातील दगडी प्रवेशद्वार तर अलीकडील काळात मंदिराचे नुतनीकरण करून गोकाकच्या खडकातून सुंदर घडवलेले कोरीव खांब, महिरपी स्वरूपातील मनमोहक नक्षीकाम, कोरीव शिल्प, नंदी शिल्प अशा कलाकृतीतील गर्भग्रह, मंडप तर आर.सी.सी. स्वरूपातील शिखर बांधणी, आकर्षक रंगरंगोटी करत, जुन्या-नव्याचा संगम साधत मंदिराचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला आहे.दरवर्षी नरक चतुर्दशीस गावात एक चैतन्यमय वातावरण असते ते म्हणजे दिवाळी बरोबर श्री कल्लेश्वर यांची यात्रा म्हणून. श्री कल्लेश्वर म्हणजे महादेवांचाच अवतार. पण इथे पिंडीमध्ये हर आणि हरी दोन्ही वास करतात अशी भाविकांची श्रद्धा. यात्रेतील उत्साहाची ही परंपरा एक आगळीवेगळी पर्वणी असते. माया-लेखी तसेच काम धंद्या निमित्त गावा बाहेर गेलेल्या मंडळींना यात्रेच्या निमित्ताने लागलेली श्री कल्लेश्वराच्या दर्शनाची ओढ,विविध जाती- पंथ यांनी एकत्र येऊन केलेला उत्सव, श्री कल्लेश्वराची मूर्ती आणि सजावट ही एक वेगळीच मनमोहकता असते. उत्सवानिमित्त केलेली मुखवट्यांची सजावट आणि सजावटीत वेगवेगळ्या धान्यांचा वापर केला जातो.चौसष्ठ किलो धान्य यामध्ये हरभरा डाळ, गहू ,तांदूळ ,उडीद डाळ, खाऊची पाने आणि पाणी यापासून सण-उत्सवा निमित्त आकर्षक पूजा बांधली जाते. पंचक्रोशीत ही यात्रा प्रसिद्ध आहे.लाटवाडीतील लक्ष्मी ,अब्दुल लाट मधील बिरोबा आणि विठुराया हे तिन्ही देव आपापल्या पालखीत बसत गजी ढोलाच्या तालावर वाजत गाजत भंडारा उधळत श्री कल्लेश्वर मंदिरात पोहचतात. हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत, सर्व समाजातील मानकऱ्याच्या उपस्थितीत पालखी सोहळा होतो. यात्रेवेळी दहा हजाराहून अधिक नारळ मंदिरावर फोडले जातात. नारळ फोडून आपला अहंकार नष्ट करतो अशी त्यामागे भाविकांची श्रद्धा असते. ढोलाचा नाद, हजारोंच्या संख्येने मंदिराकडे झेपावणारे नारळ हा सोहळा प्रत्यक्ष पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे आहे.हेडंब ही एक यात्रेतील महत्त्वाची प्रथा. यात सहभागी मंदिराच्या मोकळ्या चौकात येतात. समाजातील प्रमुख व्यक्ती एका व्यक्तीला भंडारा लावून हातात तलवार देतात.सहभाग घेणारी व्यक्ती गजी ढोला सोबत ताल धरते आणि हातातील तलवार पोठावर मारुन घ्यायला सुरुवात करते. यानंतर भविष्याची केलेली भाकित म्हणजे भाकणूक सोहळा होतो. धनगर समाजातील प्रमुख व्यक्ती संकेताचा अर्थ सामान्य भक्तांना समजून सांगतात. शैव आणि वैष्णव यांचे प्रतीक असणारे हे मंदिर असल्यामुळे येथील शिवपिंडी समोर दोन श्री नंदी मूर्ती दिसून येतात. अलिकडे सुशोभीकरण केलेल्या श्री कल्लेश्वर तलाव हे श्री कल्लेश्वर देवाचे तीर्थकुंड आहे. असे हे प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे इचलकरंजी जवळील अब्दुल लाट येथील श्री कल्लेश्वर- महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,कोल्हापूर.मोबाईल नंबर ९३७०१०१२९३
 
श्री गोमतेश्वर मंदिराचे अस्ताव्यस्त पडलेले खांब ,कोरीव दगड
श्री गोमतेश्वर शिवपिंडी
श्री गोमतेश्वर शिवपिंडी.
श्री गोमतेश्वर मंदिराचे आडक पद्धतीचे असणारे कोरीव शिल्प.
श्री गोमती नदी.
श्री गोमती नदी
श्री गोमतेश्वर मंदिराचे अस्ताव्यस्त पडलेले कोरीव दगड- खांब.
 
 श्री गोमतेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले अगस्ति क्रमानुसार दक्षिण मानस यात्रेतील तीर्थ महात्म्य देवता म्हणजे श्री गोमतेश्वर- महादेव मंदिर. हुतात्मा पार्क -गार्डन येथील श्री लिंगेश्वर ,मुरलीधर गोपाल कृष्ण मंदिराशेजारी हे मंदिर असून या हुतात्मा पार्क बागेच्या पूर्व बाजूने गोमती नदी वाहत आहे. आज या नदीस ओढ्या - नाल्याचे स्वरूप देऊन नदीचे अस्तित्व नाममात्र उरले आहे ,तरी येथे अति प्राचीन, पौराणिक इतिहासाच्या पाऊल खुणा आढळून येतात हीसुद्धा आजच्या काळातील महत्त्वपूर्ण बाबी आहेत. या गोमती नदीचा उगम चित्रनगरीच्या डोंगर-कपारीत होऊन आर. के. नगर परिसर, राजेंद्रनगर झोपडपट्टी बर्ड स्कूल, मनोरा हॉटेल,अॅस्टल आधार हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल च्या मागील बाजूने के. एम.टी. वर्कशॉप समोरून शास्त्रीनगर ,वाय पी पवार नगर, हुतात्मा पार्क पूर्व बाजूहुन सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस गोमती जयंतीला मिसळते. या संगम स्थानाच्या पूर्वोक्त श्री संगमेश्वर तर पश्चिमेस श्री गोमतेश्वर हे स्थान आहे. दरम्यान या गोमती नदीस भारती विद्यापीठाच्या परिसरातून आलेला प्रवाह आर के नगर परिसरात तर शांतिनिकेतन स्कूल शेजारुन आलेला छोटा प्रवाह एस.एस.सी बोर्ड च्या पुढे मिसळायला दिसतो. तसेच शिवाजी विद्यापीठ परिसरातील जुन्या विहिरी- तलाव येथून येणारे प्रवाह अंबाई डिफेन्स परिसरातून गोमतीस मिसळलेले दिसून येतात. गोमती चे महत्व अनेक प्राचीन ग्रंथातून दिसून येते. करवीर नगरीत सर्व देवदेवता, ऋषीमुनी या प्रमाणे येथे महर्षी गौतम ऋषींचे स्थान ,गोहत्या पापमुक्त क्षेत्र मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम यांनी महायुद्धानंतर आपले शस्त्र ज्या नदीत धुतले ती नदी म्हणजे गोमती नदी असेही मानले जाते. महर्षी गौतम ऋषि स्थान महात्म्य स्मृती यास्तव श्री गोमतेश्वर स्थान इथे दिसून येते. महर्षी गौतम यांना न्याय दर्शनाचे प्रवर्तक मानले जाते. त्यांच्या पासून सुरू झालेले न्याय तसेच तर्कशास्त्र यांची परंपरा पुढे चालू राहिल्याचे दिसून येते.त्यांनी विश्लेषणात्मक दर्शनाची मांडणी केली. न्याय दर्शनाचा प्रमुख विषय ज्ञान. विश्लेषणात्मक ज्ञानाचे स्वरूप, साधन आणि प्रामाणिकता यांचा विचार केला जातो. महर्षी गौतम यांच्या विचारानुसार ज्ञान ,बुद्धी आणि उपलब्धी यामध्ये कोणतेही अंतर नसते.याद्वारे कोणत्याही विषयाचे स्वरूप अवगत होते. या अवस्थेलाच उपलब्धी असे म्हटले जाते.अथः ज्ञान विषय बोधीया विषये उपलब्धी आहे. बोध हे बुद्धी पासूनच संभव आहे आणि बुद्धी पासूनच ज्ञान उपलब्धी ज्ञान संभव आहे.ज्ञान हे स्वविषयक आहे. न्याय हा तर्क याचा पर्यायवाचक शब्द आहे. आपल्या व्यापक अर्थानुसार प्रमाणानुसार विषयाचे विश्लेषण समीक्षा करण्याच्या बौद्धिक प्रक्रियेला न्याय म्हणतात. यावर विश्लेषणात्मक मांडणी ऋषि गौतम यांनी केल्यामुळे त्यांची दर्शन मांडणी म्हणजे विशुद्ध ज्ञानाचे विज्ञान दर्शन मानले जाते. ॠषी गौतमानुसार ज्ञानासाठी चार प्रकारच्या सामग्रीची गरज असते.अनुभव आणि स्मृती असे दोन प्रकारचे ज्ञान असतात. भागवत पुराणांबरोबरच अनेक ग्रंथात गौतम, गोमती बाबत प्राचीन संदर्भ आढळून येतात."श्री करवीर यात्रानुक्रम: श्री महालक्ष्मी प्रीत्ये भवतुश्री:"या ग्रंथातही त्र्यलोक्य वंदिते देवी पापं मेहर गोमती।वाचातकृतःपापं मने साकर्मणातथा॥तत्सर्वविलयंयाति गोमती दर्शने नदी॥ वसिष्ठे समानिता मुनींनायत्र गोमती ॥स्नातोभवती गंगायांतत्रलौयुग ॥" असे संदर्भही आढळून येतात.प्रभू श्री राम, महर्षी गौतम,वशिष्ठ ऋषी यांच्या स्थान महात्म्याने पावन झालेली नदी म्हणजे गोमती नदी आणि या नदीच्या काठी असणारे मंदिर म्हणजे श्री गोमतेश्वर- महादेव मंदिर. मंदिर अतिप्राचीन असल्यामुळे मंदिर पूर्ण जमीनदोस्त होऊन मंदिराचे प्राचीन अवशेष -कोरीव दगड आज पहावयास मिळतात.श्री नंदी मूर्ती तर अर्धवट भग्नावस्थेतच आढळून येते. हुतात्मा पार्क- बागेतील श्री गोपाळकृष्ण मंदिराशेजारी या मंदिराचे कोरीव दगड -खांब अस्ताव्यस्त पडलेले दिसून येतात. अन्य काही समाधी स्मृती शिवपिंडी ही इथे दिसून येतात.श्री गोमतेश्वर शिवपिंडी वरती काही भक्तगणांनी पत्र्याची शेड उभा करत शिवपिंडी सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर मानस यात्रेतील मंदिर म्हणजे श्री गोमतेश्वर- महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव, कोल्हापूर.मोबाईल नंबर- ९३७०१०१२९३.
श्री लिंगेश्वर.
श्री लिंगेश्वर- महादेव मंदिरासमोरील श्री नंदी मूर्ती.
श्री लिंगेश्वर- महादेव मंदिर गर्भगृहातील श्री भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती.
श्री लिंगेश्वर -महादेव मंदिरा समोरील श्री नंदी मूर्ती.
श्री लिंगेश्वर- महादेव शिवपिंडी.

श्री लिंगेश्वर -महादेव शिवपिंडी
 

हुतात्मा पार्क गार्डन- बाग येथील श्री सटवाई देवी चे देवस्थान.
हुतात्मा पार्क गार्डन येथील श्री सटवाई देवी चे मंदिर.
हुतात्मा पार्क गार्डन -बाग येथील श्री लिंगेश्वर मंदिर.
हुतात्मा पार्क गार्डन येथील श्री वेताळ देवस्थान.
हुतात्मा पार्क -गार्डन बागेतली श्री लिंगेश्वर ,श्री गोपालकृष्ण मंदिर.
 
 श्री लिंगेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री लिंगेश्वर महादेव मंदिर. स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा, क्रांतीकारक यांच्या स्मृती जपलेली बाग म्हणजे हुतात्मा गार्डन- बाग. याचबरोबर भुत, जादूटोणा,काळ, वेताळ अशा रंजक कथांनी भरलेली जागा म्हणजे हे बागेचे ठिकाण. अतिप्राचीन काळी या ठिकाणास द्वारका बेट म्हणूनही ओळखले जात होते. भगवान योगेश्वर श्रीकृष्णांना गर्गमुनींनी करवीरी जाण्यास सांगितले होते. कृष्णकृत हरीकुंड ही या ठिकाणी पहावयास मिळतो. "करवीर महात्म्य","श्री करवीर यात्रानुक्रमः, श्री महालक्ष्मी प्रीत्येभवतुश्री"," करवीर महात्म्यस्यतीर्थदेवता" या प्राचीन ग्रंथामध्ये लिंगतीर्थ- लिंगेश्वर तसेच येथील स्थान महात्म्य वर्णन दिसून येते. या बागेच्या मधोमध वेताळ देवस्थान आहे. हे देवस्थान नेहमी उघड्यावर असते. यांना कोणी बंदिस्त करू शकत नाही. या प्रमाणे एका झाडाखाली दगडी चौथर्यावर शेंदूर लावलेले सहा दगड-गोटे स्वरूपात हे वेताळ देवस्थान आहे. येथे जिवंत सती गेलेल्या महिलांच्या ही स्मृर्ती शिळा आहेत. या वेताळ देवस्थानाच्या समोरच थोड्या अंतरावर सटवाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. हेमाडपंती शैलीतील जुन्या मंदिराचा दगडी कोरकीपणा, खांब,जुनेपणा तसाच ठेवत तीस बाय तीस दगडी एकपाकी पत्र्याचे शेड बांधणी करत सुंदर मंदिराची उभारणी केली आहे. येथेही शेंदूर लावलेले सहा दगड-गोटे स्वरूपात श्री सटवाई देवीचे स्थान आहे. जन्मजात बाळाचे भविष्य श्री सटवाई देवी लिहिते अशी भाविकांची श्रद्धा असलेमुळे नवजात शिशु बालकांना इथे आणण्याची जुनी प्रथा आहे. हे सटवाई चे मंदिर बागेच्या एका बाजूला तर बरोबर दुसऱ्या बाजूला सावित्रीबाई फुले रुग्णालय- दवाखान्याच्या पाठीमागील बाजूस जयंती आणि गोमती संगम स्थान आहे. येथील पुलाजवळील रस्त्यावर हुतात्मा पार्क बागेच्या प्रवेशद्वाराजवळून प्रवेश करतात बागेच्या आत मध्ये हे श्री लिंगेश्वर महादेव मंदिर आहे. प्राचीन हेमाडपंती शैलीतील बारा बाय बारा दगडी एक पाकी स्वरूपातील हे मंदिर आहे.मंदिराबाहेरील श्री नंदी मूर्तीस मंदिराला लागूनच दगडी भिंती ,आर.सी.सी. छत ,लोखंडी रेलिंग करत सुरक्षित नंदीमंडप उभारणी केली आहे. अतिप्राचीन काळात असलेले कौलारू स्वरूपाचे एकदम साधे मंदिर, विहीर यांच्या पाऊलखुणा आजही पहावयास येथे मिळतात. श्री विष्णू, गरुड, लक्ष्मी, नारद अशा मूर्ती ही येथे दिसून येतात. प्रामुख्याने श्री भगवान योगेश्वर मुरलीधर श्री गोपाळकृष्ण यांची गर्भगृहात असणारी सुंदर मूर्ती यामुळे हे लिंगेश्वर मंदिर श्री गोपाळकृष्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हुतात्मा पार्क गार्डन याआधी ही वेतांळाची जागा-बाग हीच ओळख होती. याच बरोबर भगवान योगेश्वर श्रीकृष्णांचे करवीर नगरीतील या ठिकाणी असणारे वास्तव्य यामुळे हे स्थान द्वारका बेट म्हणून ही प्रचलित आहे. भगवान योगेश्वरांचे लिंग रूपातील स्थान यास्तव हे लिंगेश्वर स्थान दक्षिण काशी क्षेत्र करवीर नामावली मध्ये तसेच द्वारका बेट- सद्यस्थितीतील हुतात्मा पार्क गार्डन येथे आढळून येते. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री लिंगेश्वर-महादेव मंदिर. . उदयसिंह मानसिंगराव राजेयादव, कोल्हापूर.मोबाईल नंबर - ९३७०१०१२९३.
श्री श्रृंगेश्वर महादेव शिवपिंडी.
श्री श्रृंगेश्वर महादेव मंदिर येथील नंदी मुर्ती
प्रभु श्रीराम यांची बहीण शांता यांचे लिंग स्थान.
श्री श्रृंगेश्वर महादेव मंदिर येथील नंदी मुर्ती.
श्री श्रृंगेश्वर महादेव मंदिर.
गिरीगोसावी यांचे समाधी मंदिर.
श्री श्रृंगेश्वर तसेच शांतालिंग. 
 
श्री श्रृंगेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करविर यात्रानुक्रम मालिकेतील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री श्रृंगेश्वर महादेव मंदिर. कोल्हापुर पंचगंगा नदी घाट श्री सिद्धेश्वर महाराज - गुरु महाराज मंदिराहून तसेच शेतवटातून पुढे गेल्यावर पंचगंगा नदी तिरापासून थोड्या अंतरावर जमिनीपासून पाच सहा फूट उंच टेकाडावर हे श्री श्रृंगेश्वर- महादेव मंदिर आहे. ऊस शेती, झाडेझुडपे यातून मार्गक्रम हे सर्व कठीणप्रद आहे. यापेक्षा श्री उत्तरेश्वर महादेव मंदीर उत्तरेश्र्वर पेठ येथून शिंगणापूर- लक्षतीर्थ वसाहतीकडे जाणारा चांगला डांबरी- खडीचा पक्का रस्ता बनवलेला आहे. या रस्त्याने थोडे पुढे आल्यावर एक ओढा- नदी आणि त्यावर पुल आढळतो. येथून उजव्या बाजला गाडीवाट स्वरूपाचा कच्चा रस्ता आहे. या कच्च्या रस्त्यावरून काटकोन स्वरूपातील तीन चार वळणे घेताच मंदिर दृष्टिक्षेपात पडते. पावसाळ्यातील दिवसात रस्त्यात वाढलेले गवत, घसरण, चिखलगुठ्ठा पणा यामुळे मार्गक्रमण अशक्यप्रद असते.पावसाळा सोडून एरवीच्या दिवसात मंदिरापर्यंत गाडीने आरामात पोहोचू शकतो. सहज सुलभ दर्शन घडू शकते. या शेतवटातील गाडीवाट, पायवाटेने मंदिरापर्यंत पोहोचतात पन्नास बाय शंभर असा दगड माती स्वरूपातील चार पाच फुटाचा उंचवठा- टेकडी सदृश्य भाग दिसून येतो. सभोवताली चिंच,रामफळ अशी नैसर्गिक झाडी आहे. या उंचवट्याच्या मधोमध हे श्री श्रृंगेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिर वीस बाय पंचेचाळीस दगडी बांधीव एक पाकी आहे. पुढे नंदीमंडप तर पंधरा बाय पंधरा गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप. या दगडी जुन्या मंदिरास अलीकडील काळात सिमेंटचा गिलावा डागडुजी करत मंदिर सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गर्भगृहात श्री श्रृंगॠषी यांचे लिंग स्वरूपातील स्थान हे उत्तराभिमुख शिवपिंडी स्वरूपात असून या शिवपिंडी च्या पाठीमागे प्रभू श्रीराम यांची बहीण शांता यांचे लिंग स्वरूपातील स्थान आहे. आता येते गिरीगोसावी वगैरे कोणी नाहीत परंतु जुन्या काळात काही गोसावी, बैरागी येथे रहात असल्यामुळे या स्थानाची ओळख गोसाव्यांचा मठ अशीच बनली होती. मंदिराच्या ईशान्य दिशेला पाच बाय पाच दगडी एक बाकी प्राचीन जसेच्या तसे एक मंदिर आहे. हे मंदिर गिरीगोसावी स्वामींचे समाधिस्थान आहे. याचबरोबर मंदिराच्या पुढे तसेच पाठीमागील बाजूस ही गिरी गोसावी यांची समाधी दगडी शिल्पे पादुका शिवलिंग स्वरूपात दिसून येतात. हेमाडपंती शैलीतील जुन्या बांधकामाचे वेल बुट्टी,पान त्रिकोण स्वरूपातील दगड ही मंदिर परिसरात आढळून येतात. मंदिरा सभोवती असणारी रामफळाची झाडे म्हणजे कौसल्येचा राम कृपा दृष्टी दिसून येते. खरे तर हे स्थान प्रभू श्रीराम यांची थोरली बहीण कौसल्या पुत्री शांता हिचे स्थान आहे. प्रभू श्रीराम यांची बहीण शांता तिचे पती म्हणजे हे श्री श्रृंगॠषी होय. महाभारत रामायण काळ म्हणजे सत्य आणि धर्म यांचे स्थान सर्वात उंच होते. आपल्या साधनेच्या जोरावर ऋषी मुनी साधवी अशक्य बाबीही सहज साध्य करत असत. काही वेळेस अजिब गरिब घटना कधी घडत हे ही लक्षात येत नसे. ऋषी श्रृंगी हे महात्मा विभांण्डक यांचे पुत्र होते. ऋषी विभांण्डक एक कठोर तपस्वी होते. त्यांच्या तपसाधनेमुळे देवराज इंद्र ही काळजीत पडले होते. देवराज इंद्र यांना वाटू लागले की, घनघोर कठोर तपस्या यामुळे इंद्रराज्यही हे प्राप्त करतील की काय? असे त्यांना मनोमन वाटू लागले. यामुळेच त्यांनी उर्वशी नावाच्या अप्सरेला तपसाधना भंग करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले होते. एकदा सरोवरामध्ये श्री विभांण्डक ऋषी स्नानासाठी गेले असता उर्वशी तेथे पोहोचली. कामुक सोंदर्य यामुळे विभांण्डक ऋषीं चे वीर्य विस्कळीत झाले होते. यामुळे विभांण्डक ऋषीं च्या तपोबल यामध्ये खंड पडून विभांण्डक ऋषी आश्रमात गेल्यानंतर तहानलेली हरणी त्या सरोवराजवळ येते आणि पाणी पिताना ते वीर्य प्राशन करते. त्यामुळे ती हरणी गर्भ धारण करते.ती हरिणी म्हणजे एक देवकन्या होती. ब्रम्हाजींनी शाप दिल्यामुळे तिचे हरिणीत रूपांतर झाले होते. देवकन्येने ब्रम्हाजी यांची क्षमा मागितल्यावर हरणी जातीतून तू एका पुत्राला जन्म देशील त्यावेळी तुझी पापातून सुटका होऊन देवलोक प्राप्त करशील असा उःशाप मिळाला होता. हरिणीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर देवकन्येस देवलोक प्राप्त झाले. त्या मुलाचा जन्म हरणीच्या पोटातून झाल्यामुळे हरिणी प्रमाणे त्या बाळाच्या डोक्यावर एक छोटे शिंग होते. यामुळेच त्या मुलाचे नाव श्रृंगी असे पडले. उर्वशी अप्सरा तसेच हरिणी देवकन्या यांना श्रृंगी ऋषींची आई माता मानले जाते. पण या सुंदर लहान बाळाला इथे सोडून गेल्यामुळे विभांण्डक ऋषींना स्त्रियांबद्दल प्रचंड घृणा होती. यामुळे ऋषी विभांण्डक यांनी त्या लहान बाळाचे पालनपोषण करून वाढविले. याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करणारा तपस्वी ही त्यांनीच बनवले. यामुळे ऋषी श्रृंगी यांनी कधीही स्त्रियांना पाहिले नव्हते. ऋषी विभांण्डक,श्रृंगी ज्या वनात राहत होते तो वन भाग अगंजनपद राज्याचा भाग होता. त्यावेळी त्या राज्यावर रोमपद नावाचा राजा राज्य करत होता. एकदा त्या राज्यात भयानक दुष्काळ, सुखा पडल्यामुळे मोठे संकट आले. यावेळी राजाने विचारवंतांचा सल्ला घेतल्यानंतर एक बाब पुढे आली की, जर ऋषी श्रृंगी यांना नगरात आणले तर त्याच्या कृपेमुळे राज्याचा दुष्काळ दूर होईल. पाऊस होईल. पण ऋषी श्रृंगी यांना नगरात आणणे तेवढे सोपे नव्हते. काही सुंदर दासींना ऋषी श्रृंगीजवळ सेवेस पाठवले. परंतु याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी ऋषी श्रृंगी नगरांत जावयास तयार झाले. नगरात येताच भरपूर पाऊस झाला. ही गोष्ट ऋषी विभांण्डक यांना समजली. यावेळी विभांण्डक ऋषींच्या क्रोधा पासून वाचण्यासाठी राजा रोमपद यांनी दत्तक पुत्री,राजा दशरथ- कौशल्या पुत्री शांता आणि ऋषी श्रृंगी यांचा विवाह लावून दिला. राजा रोमपद यांच्या सल्ल्यानुसार राजा दशरथ यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता. या यज्ञाची सर्व जबाबदारी ऋषी श्रृंगी यांनी घेतली होती. यामुळेच प्रभु श्रीराम, लक्ष्मण ,भरत ,शत्रुघ्न ही मुले राजा दशरथ यांना झाली. ऋषी श्रृंगी म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या बहिणीचे पती- नवरा होते. कुंडलिनी शक्ती वर मिळवलेला विजय ही ऋषी श्रृंगी यांची कठोर तपसाधना होती.तुलशीदास विरचित "रामचरितमानस "या ग्रंथासह "करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता" अशा अनेक जुन्या ,प्राचीन ग्रंथात ऋषी श्रृंगी यांचा उल्लेख दिसून येतो. करवीर नगरी ही सर्वश्रेष्ठ दक्षिण काशी क्षेत्र असल्यामुळे येथे सर्व देवदेवता ऋषीमुनी यांचे स्थान महात्म्य लाभलेले आहे. असे हे प्रभू श्रीराम यांची थोरली बहीण शांता आणि ऋषी श्रृंगी यांचे स्थान महात्म्य लाभलेले ठिकाण म्हणजे श्री श्रृंगेश्वर- महादेव मंदिर... उदयसिंह मानसिंगराव राजेयादव, कोल्हापूर. मोबाईल नंबर -९३७०१०१२९३.
श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर मंदिर छत आतील बाजू.
श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर मंदिर.
श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर मंदिर ते पंचगंगा नदीकाठ पायर्या.
श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर मंदिर येथून पंचगंगा नदी यास जोडणारा नदीकाठ पायर्या.
श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर मंदिर पाठीमागील बाजूस असणारे समाधीस्थान.
श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर महादेव शिवपिंडी.
 श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर मंदिर शेजारी असणारी पंचगंगा नदी.
 श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर मंदिर दगडी चौकटीवरील श्री गणेश.
 
 श्री अग्रेश्वर -उग्रेश्वर ;- दक्षिण काशी,क्षेत्र करवीर यात्रानुक्रम मालिकेतील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले ,कोल्हापूर पंचगंगा स्मशानभुमी नदीकाठ शेजारी असणारे मंदिर म्हणजे श्री अग्रेश्वर - उग्रेश्वर-संगमेश्वर- महादेव मंदिर. जगामध्ये प्राचीन संस्कृती मधील एक संस्कृती म्हणजे कोल्हापूर- करवीर येथील संस्कृती मानली आहे. अश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, अतिप्राचीन काळ या काळातील करवीर नगरी चे संदर्भ पुरावे मिळालेले आहेत. त्या काळातील असणारे समृद्ध समाजजीवन, जीवनशैली, निवास ,आहार, शिकार, हत्यार या बाबतीतील प्रगल्भता कोल्हापुरात झालेल्या पुरातत्त्व उत्खननातून पुढे आली आहे. समाजजीवन जगत असताना पाणी म्हणजे जीवन आणि त्या दृष्टीने केलेले त्याकाळातील पाणीसाठा नियोजन या बाबी आधुनिक विचारवंतांनाही विचार करावयास लावणारे आहे. खेडे- ग्रामपद्धती,अलुतेपद्धती यांना जोडणाऱ्या हद्दी म्हणजे नदीच्या सीमा आणि या सगळ्याचा समुच्चय म्हणजे हे करवीर शहर. यावेळी या नद्या म्हणजे कोल्हापूर करवीरच्या जीवनदायिनी बनल्या होत्या. कोल्हापूर करवीर च्या आसपास आणि शहर-गावांमधून अनेक नद्या प्रवाहित झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने शिवा- तुळशी, भद्रा ,कुंभी - ब्रह्मरुपिणी,सरस्वती, भोगावती, मयुरी, जयंती, गोमती-गौतमी, संजीवनी, कल्लोलिनी,गाणिकी, कृष्णा, वेदा, यक्षा- वेदगंगा, असिका अशा नद्या दिसून येतात. एक नदी दुसऱ्या नदीच्या प्रवाहात मिसळते यावेळी ही संगमस्थाने अतिपवित्र मानली आहेत.दक्षिण काशी क्षेत्रातील देवदेवतांचे,ऋषिमुनींचे स्थानमहात्म्य या नद्यांच्या संगमस्थानांच्या द्वारे प्रकट झाले आहे. या प्रत्येक संगम स्थानावर त्या त्या देवतांचे स्मरण शिवलिंग-संगमेश्वर द्वारे पुढे आले आहे. दक्षिण काशी क्षेत्रास सर्व देवदेवता,ऋषी-मुनी यांचा वास- आशीर्वाद लाभला आहे. या सर्व देवदेवतांना मधील सर्वात अग्र क्रमांकाचे म्हणजे सर्वात पहिल्या क्रमांकाचे संगमस्थान महात्म्य देवता म्हणजे श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर महादेव मंदिर. करवीर क्षेत्र हे भक्ती मुक्ती प्रदायनी क्षेत्र आहे. इथे सर्व पापे जळुन मुक्ती प्राप्त होते. म्हणून करवीर क्षेत्रातील स्मशानभूमी शेजारी असणारे संगमस्थानावरील प्राचीन शिवमंदिर म्हणजे श्री अग्रेश्वर-उग्रेश्वर महादेव मंदिर. आज जयंती नदीला ओढा- नाल्याचे स्वरूप दिले आहे. नदीच नष्ट करून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकवलेल्या परिस्थितीत आज जयंती नदी असली तरी तिचे प्राचीनत्व नष्ट करता येणार नाही. कोल्हापूर शहराच्या दक्षिणेला कात्यायनी देवीचे मंदिर आहे. या देवी समोरील अमृत कुंडातून या जयंती नदीचा उगम होतो. येथून हि नदि प्रवाहित झाल्यानंतर कळंबा, पाचगाव, जरग नगर, रायगड कॉलनी ,जवाहर नगर,मंगळवार पेठ, रविवार पेठ ,उद्यम नगर ,शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, सीपीआर, सिद्धार्थ नगर ,टाऊन हॉल, स्मशानभूमीच्या मागील भागातून पंचगंगा नदीला मिळते. आजच्या शहराच्या मध्यवर्ती भागातून प्रामुख्याने हि जयंती नदी फिरते. यामुळे पंचगंगा याचबरोबर जयंती नदी ही करवीर ची जीवनदायिनी होती. यामुळे याला अग्र-संगमेश्वर असे स्थान प्राप्त झाले आहे तसे प्राचीन ग्रंथातून ही नमूद केले आहे." करवीरयात्रानुक्रम: श्री महालक्ष्मी प्रीत्येभवतुश्री:॥" या प्राचीन ग्रंथातही 'सर्वतीर्थे स्नात्वासर्वेश्वर प्रभूनत्वा ततः अग्रेव्रजन ततः तत्संगमस्त' असे संदर्भ दिसून येतात.याचबरोबर "करवीर महात्म्यस्थतीर्थदेवता" या प्राचीन ग्रंथातही 'तस्यापि अग्रेतः गंगा जीवती संगमे सलींग सर्वतीर्थ'असे उल्लेख दिसून येतात. मंदिर अगदी बारा बाय बारा दगडी एक पाकी प्राचीन हेमाडपंती शैलीतील आहे. येथील शिवपिंडी याचबरोबर दगडी चौकटीवरील गणपती विशेष विलोभनीय आहेत. प्राचीन कोरकीपणाही किती मनमोहक असू शकतो याचं दर्शन येथे घडते. मंदिरासमोर अखंड यज्ञकुंड धुनी आहे. येथील स्थानिक भक्तांनी पत्र्याचे शेड, फरशी, बांधिव कट्टे अशा सुधारणा करत मंदिर आणि मंदिर परिसर स्वच्छ, पवित्रमय ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याचबरोबर प्रदोष, महाशिवरात्री अशा प्रसंगी विशेष पूजा, महाप्रसादाचे ही आयोजन केले जाते.सत्तर,ऐंशी च्या दशकामध्ये हे मंदिर नदी काठी काठी असल्यामुळे मंदिरच चिखलगुठ्यामध्ये दडले होते. पण स्मशानातील महादेव याचे महत्त्व ओळखून काही लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता कठड्याची डागडुजी करत मंदिराचे संवर्धन केले. स्मशानातील महादेव म्हणून उग्र स्वरूपातील स्थान म्हणून स्थानिक भाविक या स्थानास श्री उग्रेश्वर म्हणून ओळखतात, तर कोल्हापुरातील अग्र- पहिल्या क्रमांकाचे संगमस्थान म्हणून श्री अग्रेश्वर- संगमेश्वर पण जयंती नदीलाच नाला-ओढ्याचे स्वरूप दिल्याने प्राचीन ओळख पुसटशी होत चालली आहे. असे हे दक्षिणकाशी क्षेत्र करवीर येथील श्री अग्रेश्वर- उग्रेश्वर- संगमेश्वर- महादेव मंदिर.
श्री नंदी मंदिर, श्री क्षेत्र जोतिबा डोंगर-वाडी रत्नागिरी
श्री केदारेश्वर मंदिर ,श्री क्षेत्र जोतिबा, वाडी रत्नागिरी.
श्री केदारेश्वर मंदिर, श्री क्षेत्र जोतिबा, वाडी रत्नागिरी.
श्री रवळेश्वर शिवपिंडी.
श्री रवळेश्वर शिवपिंडी. 
 
 श्री रवळेश्वर ;- दक्षिण काशी, क्षेत्र करवीर यात्रानुक्रम मालिकेतील प्राचीन मंदिर म्हणजे श्री क्षेत्र जोतिबा, वाडी रत्नागिरी येथील श्री रवळेश्वर- महादेव मंदिर. धार्मिक ग्रंथानुसार रज,तम,सत्व यांचे एकरूपत्व असलेल्या भैरवास श्री रवळेश्वर म्हटले जाते. काशी क्षेत्रात अतिप्राचीन काळी असुरांचे युद्ध झाले. त्यावेळी असुरानी प्रथम रूधिरोदगाराला पुढे पाठवले.तो रवळेश्वराच्या मार्गात आडवा आला.रूधिरोदगार हा रक्तभोजाचा सावत्र बंधू होता. रूधिरोदगार आणि रवळेश्वराचे निकराचे युद्ध झाले. त्याचे ते युद्ध जवळपास दोन प्रहरापर्यंत चालले होते. शेवटी रवळेश्वराने रूधिरोदगाराचे पाय धरून आकाशात गरागरा फिरवले व जमिनीवर जोरात आपटले.अशा तऱ्हेने रवळेश्वराने जोरदार मिळवलेल्या विजयाचा सर्वांनी जयजयकार करत स्वागत केले.यावेळी सूर्यदेव,शेष असे देवाधिकही तेथे आले.या असुर युद्ध क्रमामध्ये शेवटी केदारनाथ यांचे महाबलाढ्य रत्नसुराशी युद्ध झाले. रत्नासुराने जाणले की, केदारनाथ हे रवळनाथाचे अवतार आहेत आणि तो म्हणाला की, हे दक्षिणाधिशा तूझी सर्व रूपे बहुतेक मला ठाऊक आहेत. त्यादिवशी दोघांचे घनघोर युद्ध झाले. नाथांनी आपल्या बाणांनी रत्नासुराचा मुगुट उडविला. तेव्हा त्याच्या मुगुटातील रत्ने सर्वत्र पसरली. तेव्हा पासून जोतिबा डोंगर हा रत्नागिरी म्हणून ओळखू लागला. अशाप्रकारे तीन रात्री सतत युद्ध चालले होते. केदारनाथांची युद्धात झालेली फारच दमछाक पाहून चरपटंबा- चोपडाई चौथ्या दिवशी रणांगणावर पोहोचली. चोपडाईने केदारनाथाचे अंगावर अभेद्य कवच चढविले. चर्पटंबेने रत्नासूराला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण हे ऐकून रत्नासूर आणखीनच चिडला. तो गदा फिरवत केदारनाथांवर चालून आला. चार दिवस निराहार राहून केदारनाथ व रत्नासूर लढत होते. यावेळी रत्नासुराची चर्पटंबे बद्दल निंदानालस्ती,बडबड सुरूच होती. यामुळे चरपटंबेने आपल्या हातातील तीक्ष्ण बाणाने रत्नासुराचे शस्त्र उडवले. चरपटंबेने परीघाने वार करताच रत्नासूर खाली कोसळला. रत्नासूर खाली कोसळतात त्याबरोबरच चरपटंबेने रत्नासुराचे मस्तक छेदले. त्यातून दोन असुर बाहेर पडले. ते दोघेही चर्पटंबेवर धावून गेले. त्यांनीही चरपटंबेने लगेच ठार केले. चर्पटंबा ही सुद्धा श्री रवळेश्वर - केदारनाथाच्या शक्तीचे एक रूप होते.म्हणूनच रत्नासुराला श्री केदार नाथांनी आपल्या शक्तीद्वारे मारले असे म्हटले जाते. असे हे श्री रवळेश्वर स्थान महात्म्य हे चोपडाई देवी चे स्वरूप म्हणून श्री चोपडाई देवीचे समोर होते. यवन कालखंडात झालेली मंदिराची पडझड यामुळे या देवी समोरील हे लिंग श्री केदारेश्वर मंदिरात पुर्नप्रतिष्ठापीत केले आहे. यामुळे या लिंगा समोर श्री नंदी मूर्ती नसून हे लिंग पूर्वाभिमुख आहे. तसेच या शिवपिंडीवर वज्रलेप प्रक्रिया करून ही शिवपिंडी जपण्याचा ही प्रयत्न झालेला दिसून येतो. अलीकडील शंभर दोनशे वर्षांपासून या शिवपिंडीस श्री काशी विश्वेश्वर- काशी विश्वनाथ अशी ओळख निर्माण केल्यामुळे अलीकडील अभ्यासक ही काशीविश्वेश्वर अशीच पुष्टी देत वाटचाल करताना दिसतात. पण प्राचीन ग्रंथांचा आधार घेता दक्षिण काशी यात्रानुक्रम या मधील श्री काशीविश्वेश्वर हे स्थान महात्म्य कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरा शेजारी घाटीदरवाजा येथे आहे. आणि हे चोपडाई देवी मंदिरासमोरील शिवलिंग स्थान हे श्री रवळेश्वर स्थानमहात्म्य आहे. याच बरोबर श्री "करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता " या प्राचीन ग्रंथात ही चर्पटंबा |तत्तीर्थ रवळेश्वर असे असे संदर्भ दिसून येतात. याचबरोबर "श्री करवीर यात्रानुक्रमः श्री महालक्ष्मी प्रीत्येभवतु श्री" या ग्रंथातही 'चर्पटंबा तीर्थस्नात्वो चर्पटंबापुज्य रवळेश्वर असे उल्लेख आढळून येतात. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर यात्रानुक्रम या मधील प्राचीन शिवमंदिर म्हणजे श्री जोतिबा -वाडी रत्नागिरी डोंगरावरील श्री केदारेश्वर मंदिर येथील श्री रवळेश्वर- महादेव मंदिर.
श्री केदारेश्वर मंदिरा समोरील असणारे श्री नंदी मंदिर यातील श्री नंदी मूर्ती.
श्री केदारेश्वर शिवपिंडी श्री क्षेत्र जोतिबा.
श्री केदारेश्वर मंदिर दगडी चौकट.
श्री केदारेश्वर मंदिर चौकटीवर कोरलेले कीर्तिमुख.
श्री केदारेश्वर शिवपिंडीची बांधलेली आकर्षक पूजा.
श्री केदारेश्वर मंदिर प्रवेशद्वार.
 
 री केदारेश्वर ;- श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी, जोतिबा येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री केदारेश्वर-महादेव मंदिर. श्री जोतिबा देव म्हणजेच केदारनाथाचे रूप असून जोतिबा डोंगर- मैनगिरी पर्वत येथे मूळ अवतीर्ण झालेल्या ठिकाणाचे स्मरण म्हणून त्या ठिकाणी हे श्री केदारेश्वर स्थान आहे. म्हणून या स्थानास श्री केदारलिंग असेही म्हणतात. केदाग्रतःत तीर्थ हे लिंग स्थानापासून समोर तसेच येथे प्राचीन काळी रामेश्वर तीर्थ - रामतीर्थ हि येथेच असल्यामुळेच या तीर्थकुंडास देवतळे म्हणले जाते. पुढे यादव कालखंडात या तीर्थ कुंडास दगडी पायर्यांनी बंदिस्त करण्यात आले, तर आता सध्या दिसणारी देवबाव ही ऐतिहासिक कालखंडातील बांधीव रचना आहे. पन्हाळागडास एक सारखा असा हा दुसरा डोंगर असल्यामुळेच स्वराज्यातील काही घराण्यांनी या डोंगराचा उपयोग शत्रुपक्षाला चकवा देण्यासाठी केलेला दिसून येतो. यासाठी येथील तळी,बाव यांचा या ऐतिहासिक व्यक्तींनी सोयीनुसार वापर केलेला दिसून येतो. तशा अनुषंगाचे अनेक जुने कागद दिसून येतात. शत्रुपक्षाच्या हल्ल्यातून मंदिराची झालेली पडझड ही विदीग्नता आणणारी आहे. देवगिरी नरेश सम्राट सिंघणदेव यांचे मंदिर बांधकाम संदर्भातील दोन शिलालेख महाद्वार दरवाजा,बाजारपेठ कमानीत होते. त्यांचे वाचन कोल्हापुरातील इतिहास संशोधक अ.ब.करवीरकर यांनी केले होते. सध्या दिसणारे सुंदर दगडी बांधकामातील श्री केदारेश्वर मंदिर हे सर्वसाधारण इसवी सन अठराशे आठ साली श्रीमंत राणोजीराव शिंदे- ग्वाल्हेरकर सरकार यांनी बांधले आहे. लांबी ४९\२२ रुंदी ८९ इंची असे हे मंदिर असून छताला लघु रुद्राच्या संख्येत १२१ फरशा आहेत यामुळेच यास बिनखांबी असेही संबोधले जाते. येथील शिवपिंडी ची ग्वाल्हेरकर शिंदे सरकार यांनी पुन्:प्रतिष्ठापना केली आहे. मंदिर, चौकटी रेखीव पद्धतीच्या असून चौकटीच्या वरील बाजूस श्री गणेश तर खालच्या दगडी पट्टीवर कीर्तिमुख कोरलेले दिसून येते. मराठा बांधकाम शैली दर्शवणाऱ्या तीन सुंदर दगडी महिरपी कमानीतील मध्य कमानीतून दगडी दोन तीन पायर्या चढून दगडी चौकटीतून मंदिर गर्भगृहात प्रवेश करता येतो. मंदिरात श्री गणेश मूर्ती ही दिसून येते. या मंदिराच्या चौकटी समोर चौक स्वरूपात रिकामा परिसर असून समोरच दगडी चौथऱ्यावर नंदी मंदिर आहे. येथे दोन नंदी मूर्ती आहेत. श्री रत्नेश्वर, श्री रवळेश्वर,श्री केदारेश्वर या प्राचीन तीन मंदिरांपैकी दोन नंदी मूर्ती तसेच शिवपिंडी या श्री केदारेश्वर मंदिर येथे पुनःप्रतिष्ठापित केले आहेत. तशा अनुषंगाचे कागद आजही पहावयास मिळतात. येथे एक तुळशी वृंदावन ही दिसून येते ही एक राजघराण्यातील समाधी वृंदावन आहे. देवबाव, पुष्करणी तीर्थकुंड, तुळशीवृंदावन, श्री केदारेश्वर हा भाग म्हणजेच श्री केदाग्रतःत तीर्थकुंडाचा भाग होय. पण आजच्या काळात सर्वत्र दगडी फरसबंदी तसेच तळ्यासही विहिरीचे स्वरूप देण्यात आले आहे. असे ही दक्षिण काशी क्षेत्र करवीर यात्रानुक्रम यातील हे प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजेच श्री केदारेश्वर- महादेव मंदिर.
श्री जमदग्नीश्वर- शिवमंदिर येथील श्री नंदी मूर्ती.
एकाच दगडांमध्ये असणारे शिवपिंडी आणि श्री नंदी मूर्ती.
श्री जमदग्नीश्वर तीर्थकुंड,श्री क्षेत्र जोतिबा, वाडी रत्नागिरी
श्री जमदग्नीश्वर, श्रीक्षेत्र जोतिबा-केदारनाथ, वाडी रत्नागिरी.
श्री जमदग्नीश्वर तीर्थकुंड, श्रीक्षेत्र जोतिबा.
श्री जमदग्नीश्वर तीर्थकुंड.
 
श्री जमदग्नीश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र, करवीर यात्राक्रमानुसार प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले शिवमंदिर म्हणजे वाडी रत्नागिरी,श्री क्षेत्र जोतिबा येथील श्री जमदग्नीश्वर- महादेव मंदिर. 'जमदग्नी' या शब्दावरूनच 'जमदग्नीचा अवतार' ही म्हण प्रचलित झाली आहे. जमदग्नी म्हणजे शीघ्रकोपी, अत्यंत रागीट मनुष्य.प्राचीन, पौराणिक कथेचा परामर्श घेतला तर जमदग्नी हे सप्तऋषि मधील एक ॠषी मांनले आहेत. विद्यमान मन्वंतरातील सप्तऋषि मधील क्रमांक सात चे असणारे हे जमदग्नी ऋषी यांचा जन्म भृग कुळात झाला. भगवान श्री महाविष्णु च्या अवतारातील अंश म्हणून जमदग्नी हे ओळखले जातात. श्री रेणुका देवी ही त्यांची पत्नी तर श्री परशुराम हे त्यांच्या पाच पुत्रातील सर्वात धाकटे पुत्र. ऋचिक ऋषी चे पुत्र असणारे हे जमदग्नी यांनी कठोर तपस्या आणि साधनेद्वारे सप्तऋषि मध्ये स्थान मिळवले. श्री जोतिबा- केदारनाथ हे सुद्धा जमदग्नीचे तेज:पुंज अवतार मानले गेले आहेत. वायू, तेज, पाणी, पृथ्वी,आकाश या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्ती दैवत म्हणजे श्री जोतिबा. या जोतिबा डोंगरावरील यमाई मंदिराच्या उत्तर बाजूस खाली श्री जमदग्नी तीर्थ आहे.स्थानिक लोक या तिर्थास कल्लोळ तीर्थ तसेच या तीर्थाचा उगम श्री यमाई देवीचे डावे पद्मकमलातून सुरू होतो म्हणून यमाईचे तळे असेही काही जण म्हणतात. हा डोंगरच गंधकयुक्त खनिजांनी भरलेला असल्यामुळे या तीर्थाच्या पाण्याने स्नान केल्यामुळे तसेच येथील पाणी वापरल्याने चर्मरोग, त्वचारोग बरे होतात असाही भाविकांचा समज आहे.या तीर्थाच्या वरच्या भागात हे श्री जमदग्नीश्वर शिवमंदिर स्थान आहे. काहीजण यास महाकालेश्वर, नंदकेश्वर असेही म्हणतात. अतिप्राचीन काळी येथे रक्तभोज याचे निवासस्थान होते. या ठिकाणी अनेक विधी होत असत. या ठिकाणी रक्तभोजाकडे अनेक होम-हवन यज्ञ विधी केले जात. श्री जोतिबा बरोबर युद्ध करण्यास जाताना येथे असणाऱ्या वेदीमध्येच रक्तभोजाने यज्ञाद्वारे दैवतांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण तो अपयशी झाला. पुढे रक्तभोजाचा निष्पात केल्यानंतर श्री जोतिबा येथे आले. तोपर्यंत येथील पिंपळ हा सुवर्ण पिंपळ होता. नंतर तो कृष्णवर्ण झाला. रक्तभोजाने श्री महाकाली ला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला होता तो कालभैरवाने विध्वंश केला. ते रक्तभोज यज्ञवेदी स्थान या जमदाग्नि तीर्थ कुंडा शेजारी आजही पहावयास मिळते. पौराणिक आख्यायिकेनुसार ऋषी धनंजय यांनी याठिकाणी अंनत व्रताचे उद्यापन ही येथेच केले होते. हे जमदाग्नि तीर्थकुंड सर्वसाधारण ऐंशी बाय ऐंशी,तर उंची ही तेवढीच, दगडी बांधीव स्वरूपाचे आहे. या तीर्थाच्या वरच्या भागात एकाच पाषाणात शिवलिंग व नंदी आहेत. एकाच पाषाणातील - दगडातील कोरकीपणा यावेळी नंदीच्या डोक्यात लोखंडी खिळा ही येथे दिसून येतो. सध्याच्या काळात या शिल्पास एक फुटी संगमरवरी दगडी कठडा बांधून शिल्प सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिंग पूर्वाभिमुख तर श्री नंदी दक्षिणाभिमुख आहे. शिवाय या श्री नंदी मूर्तीच्या मस्तकावर लोखंडी खिळा खूण म्हणजे श्री नंदीश्वर म्हणजे वीरभद्राचे रुद्र रूप असून मस्तकावरील ही खूण म्हणजे प्रलयाची खूण मानली जाते. प्राचीन काळी या स्थानी श्री कपिलमुनी वास्तव्य करून राहिले होते यामुळे या परिसरात श्री कपिलाश्रम असेही म्हणतात. तसेच या क्षेत्री तेली महाराज यांचे मठ- समाधीस्थान, श्री नरसिंह मंदिर ही दिसून येतात. असे हे श्री करवीर यात्रानुक्रम: ,श्री महालक्ष्मी प्रीत्येभवतुश्री: या तसेच अनेक प्राचीन ग्रंथात नामोल्लेख असलेले, याचबरोबर प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे श्री जमदग्नीश्वर- महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,कोल्हापूर.मोबाईल नंबर-९३७०१०१२९३.
श्री रामेश्वर मंदिर वाडी रत्नागिरी येथील श्री गंडभैरव मूर्ती.
श्री सुवर्णभैरव मूर्ती.
श्री रामेश्वर मंदिर वाडी रत्नागिरी येथील रामेश्वर मंदिरातील श्री नंदी मूर्ती.
श्री वाडी रत्नागिरी येथील श्री रामेश्वर मंदिर.
श्री रामेश्वर मंदिर वाडी रत्नागिरी येथील श्री रामेश्वर शिवपिंडी.
श्री रामेश्वर मंदिर वाडी रत्नागिरी येथील श्री भैरव मुर्ती.
श्री रामेश्वर मंदिर वाडी रत्नागिरी येथील श्री रामेश्वर मंदिरातील प्रभू श्रीराम मूर्ती.
श्री रामेश्वर मंदिर वाडी रत्नागिरी श्री क्षेत्र जोतिबा.
श्री रामेश्वर मंदिर वाडी रत्नागिरी येथील रामलिंग मंदिरातील श्री नंदी मूर्ती.
 
 श्री रामेश्वर ;- श्री क्षेत्र जोतिबा डोंगर ,वाडी रत्नागिरी येथील प्राचीन स्थानमहात्म्य लाभलेले तसेच दक्षिण काशी क्षेत्र करवीर यात्रानुक्रम मध्ये अधोरेखित असलेले शिवमंदिर म्हणजे श्री रामेश्वर- रामलिंग -महादेव मंदिर. कोल्हापूर परिक्षेत्रात श्री रामेश्वर नावाची अनेक जुनी मंदिरे आढळतात. प्रत्येक क्षेत्राचे स्थान महात्म्य वेगवेगळे आढळून येते. श्रीक्षेत्र जोतिबा येथील श्री रामलिंग- रामेश्वर मंदिरास ही असेच पौराणिक स्थानमहात्म्य लाभलेले आहे. प्रभू श्रीराम अवतारातील नदीपार करविणारा केवट हा प्रभू श्रीराम भक्त होता. त्याने प्रभू श्री रामचंद्रांकडे आपला उद्धार करण्याची विनंती केली. त्या वेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यास श्री केदारनाथ अवतारामध्ये उद्धार करण्याचे अभिवचन दिले. श्री केदारनाथ अवतारामध्ये श्री जोतिबा-केदारनाथांनी गोमा सावंत याचा मुलाप्रमाणे सांभाळ केला. गोमा सावंत म्हणजे पूर्वश्रमीचा राम अवतारातील केवटच होय. केदार नाथांनी केवटास श्रीराम अवताराचे स्मरण करून त्यास दिलेले अभिवचन पाळण्याचे ठरवले. यावेळी या केवटाने श्री जोतिबाकडे चारीधाम यात्रा तसेच बारा ज्योतिर्लिंग यात्रा दर्शनाची इच्छा व्यक्त केली. यावेळी केदारनाथांनी श्री रामेश्वर ची स्थापना करून प्रभू श्रीराम अवताराचे स्मरण करून दिले. यामुळे या स्थानमहात्म्य क्षेत्रास श्री रामलिंग- रामेश्वर असे म्हटले जाते. धार्मिक, पौराणिक ग्रंथ संदर्भानुसार अशी माहिती पुढे येत असली तरी वैज्ञानिक भौगोलिक दृष्टिकोनातून ही स्थाने मानवी जीवनासाठी कशी उपयुक्त आहेत या बाबीही तितक्याच विचाराधीन आहेत. हा डोंगर म्हणजेच औषधी वनस्पती च्या रत्नांची खानच आहे. शमी,बोरी, औदुंबर, चाफा, चंदन, बेल ,लिंब, शेवंती,दवणा,कमळ अशी अनेक प्रकारची झाडे -फुलझाडे याचबरोबर सुवर्ण पिंपळ तसेच अनेक तीर्थकुंड यामुळे डोंगरावरील खडा- माती सुद्धा रत्ना प्रमाणे मानली जात असे. या मुळेच पुनर्जन्म झाला तर सह्याद्रीची माती होईल अशी म्हण ही प्रसिद्ध झाली आहे. येथील खनिज घटकांमुळे पाण्यामध्ये तयार होणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.या श्री रामेश्वर मंदिराशेजारी- समोरच असणारी बाव-विहिरीस देवबाव म्हणून ओळखले जाते. आजही या तीर्थ कुंडातील पाण्यानेच श्री केदारनाथ जोतिबाचे स्नान, नित्यनैमित्तिक विधी यासाठी वापर केला जातो. या तीर्थ कुंडातील पाण्याचे औषधी गुणधर्म यामुळेच भक्तांचे गंडमाला किंवा गालगुंड असे आजार, रोग झाल्यास त्यांची मुक्तता होते अशीही भाविकांची श्रद्धा आहे. या श्रद्धा भावनेतुनच या मंदिरात श्री गंडभैरव,श्री सुवर्णभैरव या देवतांच्या मूर्ती दिसून येतात. यातूनच मंदिराविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध झाल्या आहेत. पूर्वी जर गावातील एखादी महिला बाळंतपणामध्ये अडली तर त्या वेळी तिचे नातेवाईक या मंदिरात येऊन येथील श्री नंदीस गाऱ्हाणे घालत व बाळांतीन बाईची सुखरूप सुटका करण्यास सांगून त्या नंदीचे तोंड उत्तरेकडे फिरवत असत. बाळंतीण सुखरूप प्रस्तुत झाली की या नंदीची पूर्ववत विधिवत पूजा करून दहीभाताचा नैवेद्य अर्पण करत असत. यामुळे हा नंदी म्हणजे जोतिबा डोंगरावरील वैद्यराज मानला जात असे. हे लिंग तीर्थस्थान भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे आहे अशीही भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरामध्ये लिंग,प्रभू श्रीराम मूर्ती, गणपती, सुवर्णभैरव, गंडभैरव अशा मूर्ती आढळून येतात. यादवकालीन मंदिराचे जुने दगडी शिल्प, विरगळ आजही येथे दिसून येतात. मंदिराचे गर्भगृह सर्वसाधारण तेरा बाय तेरा असून उंची साधारण तीस एक फूट आहे. इसवीसन सतराशेऐशी मध्ये मालजी निकम- पन्हाळकर यांनी मंदिराचे पुनरूजीवन करुन बांधणी केले आहे. खास मराठा बांधकाम शैलीतील शिखर बांधणी हेही या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. श्री जोतिबा मंदिर पश्चिम बाजू पालखी सदर या शेजारीच हे मंदिर असल्यामुळे तसेच जोतिबा आवार परिसर मंदिर यामुळे भाविकांची असणारी रेलचेल यास्तव जुने मंदिर तसेच ठेवून सध्य परिस्थितीत मार्बल फरशी बसवत स्वच्छताही ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. असे ही दक्षिण काशी क्षेत्र करवीर, वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील श्री रामेश्वर- रामलिंग- महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव ,कोल्हापूर. मोबाईल नंबर -९३७०१०१२९३.
श्री कर्पूरेश्वर महादेव शिवपिंडी.
श्री कर्पूरेश्वर तीर्थकुंड, कर्पूरबाव,
श्री कर्पुरेश्वर महादेव मंदिरातील श्री नंदी मूर्ती.

श्री कर्पुरेश्वर महादेव मंदिर.
श्री कर्पुरेश्वर महादेव मंदिरातील श्री गणेश मूर्ती.
श्री कर्पूरेश्वर महादेव शिवपिंडी.
 
श्री कर्पुरेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर ,कोल्हापूर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरी येथील प्राचीन शिवमंदिर म्हणजे श्री कर्पुरेश्वर- महादेव मंदिर. कोल्हापूर पासून बारा ते चौदा किलोमीटर अंतरावर सुप्रसिद्ध प्रख्यात देवस्थान,दैवत क्षेत्र म्हणून जोतिबाचा डोंगर ओळखला जातो. अतिप्राचीन काळी या जोतिबा डोंगरास रत्नपर्वत म्हणून ओळखले जात होते. श्री केदारनाथांनी रत्नासुराचा निष्पाद केल्यामुळेच रत्नपर्वतास वाडी रत्नागिरी, जोतिबा चा डोंगर म्हणून ओळखले जाते. जोतिबा डोंगराच्या मध्यभागी सांगळे गल्ली येथे कर्पुरतीर्थ कुंड दिसून येते. मुस्लिम राजवटी दरम्यान या पवित्र कर्पूरकुंडास कर्पूरबाव असेही नामाभिधान प्राप्त झाले आहे. यादवकालीन मंदिराच्या काही पाऊलखुणा जुन्या शिल्पाच्या माध्यमातून दिसून येतात. छत्रपतींच्या राजवटी मधील मनसबदार हिंमतबहाद्दर-चव्हाण, ग्वाल्हेरकर- शिंदे सरकार, नंदिकर- निंबाळकर सरकार यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र जोतिबा येथील सुधारणा डागडुजीची कामे या काळातच होऊन कर्पूरबाव तीर्थकुंडाची बांधीव रचना हि या कालखंडातीलच दिसून येते. त्या अनुषंगाने तसे जुने ऐतिहासिक कागद ही दिसून येतात." करवीर महात्म्य", "करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता" या जुन्या प्राचीन ग्रंथात ही श्री कर्पूरेश्वर स्थानाचा उल्लेख आढळून येतो. अगस्ती आणि लोपामुद्रा यांनी ही या क्षेत्री येऊन श्री कर्पुरेश्वराचे दर्शन घेतल्याची नोंद "श्री करवीर यात्रानुक्रमः। श्री महालक्ष्मी प्रीत्यैभवतुश्रीः।" या ग्रंथात ही दिसून येते. मोठ्या भक्तिभावाने या लिंगाचे दर्शन घेतल्यास सात्विकतेने, मनोभावे आराधना केल्यास या रंग बदलणाऱ्या लिंगाचे पांढऱ्या शुभ्र अशा कर्पूर वर्णांमध्ये, रंगांमध्ये नयनरम्य अद्भुत दर्शन होते म्हणूनच या क्षेत्र स्थानास श्री कर्पूरेश्वर असे म्हटले जाते. अगस्ती आणि लोपामुद्रा यांनी ज्या वेळी या लिंगाचे दर्शन घेतले त्यावेळी पांढर्याशुभ्र कर्पूर रंगांमध्ये भगवंतांनी दर्शन दिले असेही सांगितले जाते. प्रत्येक युगामध्ये या लिंगाचा वर्णन बदलत जातो असेही मानले गेले आहे. पहिल्या कृतयुगामध्ये रौप्य, त्रेता युगामध्ये सुवर्ण,द्वापार युगामध्ये ताम्रवर्ण, कलियुगामध्ये या लिंगाचा वर्ण लोहा सारखा झाला आहे. यामुळेच हे स्थान बारा ज्योतिर्लिंग मधील मांनले असून यास श्री कृष्णेश्वर किंवा घृष्णेश्वर असेही म्हणतात. श्री जोतिबा कथासार या मधील श्री द्वादश ज्योतिर्लिंग या भागात श्री कर्पुरेश्वर- महादेव याचा उल्लेख आढळून येतो. जोतिबा डोंगरावरील हे श्री कर्पूरेश्वर मंदिर छोटेखानी, पूर्वाभिमुख असून दोन वर्षापूर्वीच या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मंदिरातील आतील भाग गर्भगृह जुन्या स्वरूपाचाच आहे तसाच ठेवून त्यावर शिखर आर.सी.सी. वीट बांधकाम स्वरूपात नंतर बनवले आहे. हे मंदिर दहा बाय दहा स्वरूपाचे सर्वसाधारण असून मंदिरात शिवलिंग, नंदी, गणपती अशा मूर्ती दिसून येतात. याच बरोबर या मंदिरा शेजारी असणाऱ्या कर्पुर तीर्थ कुंड्यांमध्ये मनिकर्णिका प्रकट झाल्यामुळे या तीर्थ-पाण्याचा रंग बदलतो अशीही भाविकांची श्रद्धा आहे. जोतिबा डोंगरावर महत्वाचे सण उत्सव विधी, विजयादशमी अशाप्रसंगी श्री जोतिबा देवाची आरती येथे येते. श्री क्षेत्र जोतिबा येथील सांगळे गल्ली या ठिकाणी असणारे हे सर्वसाधारण शंभर बाय शंभर फूट असे भव्य कर्पूर कुंड तसेच श्री कर्पुरेश्वराचे महत्त्व ओळखून अनेकांनी केलेली ऐतिहासिक जुन्या काळातील स्तुतीपर रचलेली पदे- कवणे ही दिसून येतात. आज ही अनेक भाविक ही पदे-गाणी मोठ्या भक्तिभावाने म्हणताना आढळून येतात. असे हे श्री क्षेत्र जोतिबा, वाडी रत्नागिरी येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले दक्षिण काशी क्षेत्र करवीर यात्रानुक्रम यामधील शिवमंदिर म्हणजे श्री कर्पुरेश्वर-महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,कोल्हापूर.मोबाईल नंबर -९३७०१०१२९३.
 
श्री नरसिंह मंदिर चौकटी पाशी असणारा शिलालेख.
श्री मुग्दलेश्वर मंदिरातील श्री शेषनाग मुर्ती.
श्री कमलजा देवी मंदिर.
श्री मुग्दलेश्वर मंदिरातील कासव शिल्प.
श्री नरसिंह, श्री कमलजादेवी, श्री मुग्दलेश्वर महादेव मंदिर.
श्री मुग्दलेश्वर शिवपिंडी
देवनागरी लिपीतील शिलालेख.
श्री मुग्दलेश्वर मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्ती.
श्री मुग्दलेश्वर येथील नरसिंह मंदिरातील श्री नरसिंह मुर्ती.
वरून दिसणारे श्री मुग्दलेश्वर नरसिंह मंदिराचे छायाचित्र.
श्री कमलजा देवी.
कोल्हापूर चा जुना नकाशा यामध्ये दिसणारे श्री नरसिंह मंदिर.
 
श्री मुग्दलेश्वर ;- कोल्हापूर शिवाजी पेठेतील बावडेकर आखाडा शेजारी असणारे प्राचीन शिवमंदिर म्हणजे श्री मुग्दलेश्वर- महादेव मंदिर. भारतीय संस्कृतीतील मानवी जीवनाची फलश्रुती- सांगता म्हणजे काशीयात्रा मांनले आहे. "काशीस जावे नित्य वदावे" अशी म्हण ही प्रचलित आहे. काशीमध्ये सर्वाधिक, यवाधिक काशी कोणती असेल तर ती म्हणजे दक्षिण काशी क्षेत्र करवीर कोल्हापूर. असे हे स्वतः भगवंतांनी साक्षात्कार देऊन वर्णन केले आहे. एकदा शंकर व पार्वती यांच्यात वाद झाला. उत्तर काशी श्रेष्ठ का दक्षिणकाशी श्रेष्ठ तेव्हा भगवान विष्णूंनी तराजूच्या एका पारड्यात काशी क्षेत्र तर दुसर्या पारड्यात करवीर क्षेत्र ठेवले. त्यावेळी करवीर क्षेत्राचे पारडे अधिक जड झाल्यामुळे करवीर क्षेत्र हे अधिक श्रेष्ठ असा निर्णय झाला. असे करवीर महात्म्य यासह अनेक प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे. " भक्ती मुक्तीप्रदं नृणां वाराणस्या यवाधिकं " वचनानुसार करवीर क्षेत्र हे भक्ती व मुक्ती देणारे आहे. हि तुला ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण म्हणजे विरजंतीर्थ- लोणारतीर्थ म्हणून ओळखले जाते. साक्षात विष्णू स्थान असल्यामुळे मुक्ती मिळते यामुळेच या क्षेत्रास "विष्णूगया" क्षेत्र म्हणूनही मानले जाते. करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता या प्राचीन ग्रंथामध्ये ही " विरजंतीर्थ त देवल व ण्मलयतदेव विष्णुगया, तत्र पद्मजा देवी,तत्तलवणालयतटाके तुलस्या दिवन,तस्ये वोत्तरभागे धनु:ष्यटुकात्तरेणसे लिंग मुग्दल तीर्थ | तत्त टाके अश्र्वत्त्यादयः" असे संदर्भ दिसून येतात. अगदी जुन्या इसवीसन अठराशे पंच्यात्तर सालातील कोल्हापूरच्या जुन्या नकाशातही वरुणतीर्थ शेजारी श्री नरसिंह मंदिर स्वरूपात हे स्थान दर्शवले आहे. आता सध्याची बलभीम बँक-अपना बँक शेजारी हे स्थान दिसून येते. कोल्हापुरातील नवदुर्गांपैकी कमलांबा- कमलजा देवीचे स्थान ही येथे आहे. प्राचीन काळी भीमाशंकर क्षेत्रावर महादेवांनी दुर्गासुराशी युद्ध आरंभले. तेव्हा आपल्या योगिनी गणांसह महागौरी सिंहावर बसून युद्धास आली. आणि तिने दुर्गासुराचा पराभव केला. म्हणून ब्रह्मदेवांनी देवीची कमलपुष्पांनी महापूजा केली. तेव्हापासून ही गौरीदेवी कमलजा नावाने प्रसिद्ध झाली. येथील छोटेखानी तळ्यास विरजंतीर्थ तसेच लोणार तिर्थ म्हणूनही ओळखले जात होते. धार्मिकतेतुन हे क्षेत्र विष्णू गया असल्यामुळे देवकर्मे, पितृकर्मे येथे विशेष फलदायी मानली जात असे. तेथे पन्नास बाय शंभर अशा दगडी आठ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हे मंदिर आहे.सात-आठ दगडी पायर्या चढून या चौथ-यावर आल्यानंतर चार फूट उंचीची भक्कम दगडी तटबंदी दिसून येते. दगडी फरसबंदी प्रदक्षिणा वगळता चाळीस बाय साठ असे दगडी खांबावर आधारित एकपाकी मंदिर आहे. प्रथमतः पाच बाय पाच दगडी स्वरूपात या दगडी मंडपातच श्री कमलजा देवीचे मंदिर आहे. कमळावर बसलेली चतुर्भुज दोन फूट उंचीची मूर्ती आहे. या मंदिरा शेजारी मंडपातच विठ्ठल-रुक्मिणी, शेषनाग मूर्ती आहेत. येथे श्री मुग्दलेश्वराची शिवपिंडी आहे. सर्वसाधारण तीन फुटाचा परिघ असलेली ही शिवपिंडी आहे. या शेजारी मंडप दगडी भिंतींनी बंदिस्त करून श्री नरसिंह मंदिर दिसून येते. जेमतेम तीन चार फुटाची दगडी चौकटी येथे आहे. थोडे नम्र झाल्याशिवाय सन्मान मिळत नाही या उक्तीप्रमाणे हे दरवाजे दगडी छोटेखानी दिसून येतात.या चौकटीच्या उंबरठ्याजवळ देवनागरी लिपीमध्ये शिलालेखही दिसुन येतो.या चौकटीतून आत गेल्यावर पश्चिमाभिमुख श्री नरसिंह मूर्ती दिसून येते. मंदिर अकुड छोटेखानी असले तरी बलभीमलभीम- अपना बँक, पोस्ट ऑफिस इमारतीच्या वरच्या मजल्यांवर गेल्यानंतर मंदिराची अप्रतिम बांधकाम रचना दिसून येते. शिवाजी पेठेतील अध्यात्मिक भूषणावह स्थान म्हणजे हे श्री मुग्दलेश्वर महादेव मंदिर होय. ऐतिहासिक काळातील स्वराज्याचे हुकमतपनाह रामचंद्रपंतअमात्य बावडेकर यांचा वाडा, आखाडा या मंदिरा शेजारी होता.जुन्या काळातील साक्षी दर्शवणारा पंत अमात्य बावडेकर आखाडा, श्री राधाकृष्ण मंदिर आजही येथे पहावयास मिळतात. पावसाळ्यात आजच्या काळात सुद्धा या आखाड्याचे तळ्यात रूपांतर होते आणि तीर्थ कुंडाची आठवण येते., असे असले तरी विरजंतीर्थ- लोणार तळ्याशेजारी असणारे हे श्री कमलजादेवी, श्री नरसिंह, महादेव मंदिर आजही अबाधित आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर कोल्हापुर येथील श्री मुग्दलेश्वर- महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव, कोल्हापुर.मोबाईल नंबर-९३७०१०१२९३
श्री लांगुलेश्वर मंदिरासमोर असणाऱ्या दगडी मुर्ती यामधील शिवलिंग नंदी मूर्ती.
श्री लांगुलेश्वर दुतोंडी मारुती मंदिर मंडपातील लाकडी छत रचना.
श्री लांगुलेश्वर शिवपिंडी
श्री लांगुलेश्वर मंदिरासमोर प्राचीन मंदिराचे असलेले कोरीव खांब ,वीरगळ.
श्री लांगुलेश्वर मंदिर मंडप प्रवेशद्वार.
श्री लांगुलेश्वर द्विमुखी मारुती मंदिर लाकडी मंडप.
श्री लांगुलेश्वर दुतोंडी मारूती मंदिराची पाठीमागील बाजू.
श्री लांगुलेश्वर दुतोंडी मारुती मंदिर गर्भगृह प्रवेशद्वार
श्री लांगुलेश्वर मंदिराची उत्तर बाजू.
श्री लांगुलेश्वर दुतोंडी मारुती मंदिर गर्भगृहाच्या पाठीमागील खिडकीतून दिसणारे दुतोंडी मारुतीचे पाठीमागील मुख.
श्री लांगुलेश्वर मंदिरातील श्री दुतोंडी मारुती मूर्ती.
श्री लांगुलेश्वर मंदिरातील दुतोंडी मारुती मंदिर दगडी चौथरा आणि मूर्ती.
श्री लांगुलेश्वर दुतोंडी मारुती मंदिरासमोर असलेली विठ्ठल मंदिर मुर्ती तसेच वीरगळ, दगडी कोरीव मुर्ती दिसून येतात.
 
श्री लांगुलेश्वर ;- कोल्हापुरातील जुना बुधवार तालीम मंडळ ते पंचगंगा बेकरी- नदी पुलाकडे जाणारा रस्ता या मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूस असणारे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म लाभलेले मंदिर म्हणजे श्री लांगुलेश्वर - महादेव मंदिर. आजच्या काळात बहुतांश मानवाची नीतिमत्ता कमी जास्त प्रमाणात बदललेली दिसुन येत आहे. दुटप्पी वागणे, दुतोंडी बोलणं मनुष्याच्या अशा अकृत्रिम वागण्यामुळे आजच्या काळात अनेक संकटांना, गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. पण आजच्या काळात ही काही स्थान महात्म अशी आहेत की, तेथे सत्य- खरेपणा याशिवाय येथे काही चालत नाही. शिवाय येथे कोणतेही लांगूलचालन नाही. त्रास संकटे हि येतील पण तुमची जर खऱ्याची - सत्याची बाजू असेल तर ती बाब, कोणतीही गोष्ट तुमच्या सारखीच होईल अशी भाविकांची श्रद्धा असणारे स्थान महात्म क्षेत्र हे श्री लांगुलेश्वर महादेव मंदिर होय. श्री मारुती भगवान हे अजरामर- चिरंजीव मानले आहेत. येथील श्री लांगुलेश्वर महादेव मंदिर गाभाऱ्यात श्री मारुतीचीच मुख्य मूर्ती आहे आणि ती ही द्विमुखी- दुतोंडी आहे. मुख्य गाभार्यात दोन फुटांचा दगडी चबुतरा-चौथरा. या चौथर्यावर सर्वसाधारण अडीच फूट रुंदी तर चार फूट उंचीची सुंदर कोरकीपणातील दुतोंडी मारुतीची मूर्ती आहे. तिरकस स्वरुपातील पुढील बाजूस एक तोंड तर बरोबर मूर्तीच्या पाठीमागील बाजूस त्याच मुर्ती दगडात आणखी एक तोंड आहे. या मूर्तीतील दुसऱ्या पाठीमागील मुखाचे दर्शन समोरून व्हावे यासाठी मूर्तीच्या पाठीमागे तिरप्या स्वरूपात आरसा बसवला आहे की, जेणेकरून समोरील भक्तांना दर्शन व्हावे. गाभाऱ्यातील श्री लांगुलेश्वर शिवपिंडी हि खूप प्राचीन असून सुंदर आहेा.गाभारा वीस बाय वीस दगडी असून गाभार्याबाहेरूनही प्रदक्षिणा काढता येईल असा दगडी फरसबंदी मार्ग तसेच गाभाऱ्यातील तिन्ही बाजून लोखंडी ग्रील बसवलेल्या खिडक्या असून त्यातूनही दर्शन घेता येते अशी बांधकाम रचना आहे. मंदिराच्या पाठीमागील खिडकीतून ही दुतोंडी मारुती च्या पाठीमागील तोंडाचे, मुखाचे दर्शन- मुखदर्शन होते. या गर्भगृहासमोर तीस बाय पन्नास असा एक पाकी सुंदर लाकडी मंडप उभा केला आहे. भजन, कीर्तन ,प्रवचन, धार्मिक कार्यक्रम या दृष्टिकोनातून या मंडपाची उभारणी केलेली असून लाकडी खांब, महिरपी, मध्यभागी लाकडी छताची रचना, त्यास लटकवलेल्या जुन्या काळातील काचेच्या हंड्या हा जुना थाट -माट जसाच्या तसा आजही या मंदिराने जपला आहे.या मंडपातून चार-पाच दगडी पायऱ्या उतरल्यावर जुन्या प्राचीन मंदिराचे खांब ,कोरीव शिल्प, देवगिरी नरेश सम्राट रामदेवराय यांची शिल्पाकृती मूर्ती, श्री विठ्ठल मूर्ती, महादेव शिवपिंडी व नंदी अशा मूर्ती दिसून येतात. येथे असणाऱ्या वीरगळांवरून प्राचीन काळात येथे घमासान लढाई झाल्याचेही दिसून येते. अनेक स्थित्यंतरे,यवनी आक्रमणे यात सुद्धा हि स्थान महात्म पहावयास मिळतात हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. शक्यतो कोठेही पहावयास मिळणार नाही अशी येथे दुतोंडी मारुतीची मूर्ती असल्यामुळे प्राचीन श्री लांगुलेश्वर महादेव मंदिर यापेक्षा कोल्हापुरातील दुतोंडी मारुती मंदिर म्हणूनच हे स्थान प्रसिद्ध आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री लांगुलेश्वर- महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,कोल्हापूर. मोबाईल नंबर- ९३७०१०१२९३
संध्यामठाचे कोरीव नक्षीकाम असणारे खांब.
सूर्यास्ताच्या साक्षीने श्री रंकेश्वर महादेव मंदिर संध्यामठ.
संध्यामठामध्ये दिसणारी श्री रंकेश्वर शिवपिंडी.

श्री रंकेश्वर महादेव शिवपिंडी.
संध्यामठातील श्री गणेश मूर्ती.
संध्यामठ शेजारी असणारे झाड प्रसन्नता ही अनेकांना भावते.
सूर्यास्ताच्या साक्षीने खुलून येणारे संध्यामठ- मंदिर.
श्री रंकेश्वर महादेव शिवपिंडी.
खळखळत्या पाण्यामध्ये असणारे संध्यामठ-मंदिर.

संध्यामठ यामध्ये असणारी श्री गणेश मूर्ती.


सतत पाण्यामध्ये असणारे संध्यामठ मंदिर.
संध्यामठातील श्री गणेश मूर्ती.
सतत पाण्यामध्ये असणारा संध्यामठ दृश्य.
नेहमी सतत पाण्यामधील संध्यामठातील श्री गणेश मूर्ती.
संध्यामठ मंदिराचे एक विहंगमय दृश्य.
 
 श्री रंकेश्वर ;- रंकाळा कोल्हापूर शहरातील एक सौंदर्य स्थळ.या रंकांळ्याबरोबर कोल्हापूर शहराचा मानबिंदू असणारे संध्यामठ. या मठ मंदिरांमध्ये प्राचीन स्थान महात्म लाभलेले मंदिर म्हणजे रंकेश्वर- महादेव मंदिर. प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे संध्यामठ रंकाळ्याचा निसर्गरम्य परिसर, पक्षितीर्थ यामुळे संध्यामठ म्हणजे कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारी महत्त्वपूर्ण वास्तू बनली आहे. या रंकाळ्याचा परीघ तीन मैल आहे तर खोली १०.३७ मीटर इतकी आहे. दगडी छत, कोरीव खांब,वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम याचबरोबर सूर्यास्त आणि सूर्योदय यांचे विहंगमय दृश्य यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यातील आगळा वेगळा पैलू बनलेली वास्तू म्हणजे हि संध्यामठ वास्तू.तलावाच्या पूर्व बाजूस ही एक मंडप वजा वास्तू असून या मंडपामध्ये नंदी, शिवलिंग, श्री गणेश अशा मुर्ती आहेत. आठ कोरीव खांबांच्या तीन पूर्व-पश्चिम रांगा या खांबांना समांतर मध्यभागी दक्षिणाभिमुख दरवाजा असलेली भिंत याचबरोबर तिन्ही बाजूंनी मंडपात येण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग असे हे रंकेश्वर मंदिर संध्यामठ चे स्वरूप. या संध्यामठ- रंकभैरव मंदिरा विषयी अनेक कथा ,कथोकल्पित कथा,दंत कथा ऐकावयास मिळतात, पण प्राचीन ग्रंथ संदर्भ ऐतिहासिक संदर्भानुसार पहावयाचे झाले तर करवीर कोल्हापूर या गावानजीकच्या सहा खेड्या पैकी रंकाळा हे एक खेडे होते. भूकंपामुळे तयार झालेल्या नैसर्गिक खाणी चा उपयोग मंदिर बांधकाम या साठी लागणारा दगड यासाठी केलेला दिसून येतो. शिलाहार, यादव राजवटीमधील मंदिर बांधकामाचे संदर्भ दिसून येतात. यादव काळामध्ये संन्यासी, बैरागी, फिरस्ती वाटसरूचे आश्रयस्थान म्हणून या मंदिरास मठ अशी नामावली तयार झाली आहे. त्याचबरोबर रंकाळा, रंकतीर्थ या रंकतीर्थाशेजारी असणारे संजाळतीर्थ यास्तव संध्यामठ अशी नामावली रूढ झाली आहे. करवीरकर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राजवटीत गजेंद्रगडकर घोरपडे सेनापती असताना जैन धर्मीयांमध्ये मोठा वाद उफाळून आला. जीनसेन यांनी लक्ष्मीसेन यांना शहरातून पळवून बाहेर लावले ते लक्ष्मीसेन या रंकेश्वर मंदिर संध्यामठाच्या छतावर जाऊन बसले यावेळी गजेंद्रगडकर घोरपडे यांनी बलुतेदार, आलुतेदार यांना बोलावून निवाडा केला. यावेळी लक्ष्मीसेन हा खरा ठरला व त्यांना वाजत-गाजत शहरात आणून लक्ष्मी सेन मठाधिपती केले. या अनुषंगाचे अनेक मोडी लिपीतील कागद पहावयास मिळतात. संध्यामठ बाबत अशा नोंदी असणारे अनेक जुने कागद पहावयास मिळतात. या रंकभैरव देवस्थान बाबत श्रीमंत छत्रपती महाराज यांनी जप्तानमुलुक- जाधव यांना इनाम जमिनी दिल्याबाबतही मोडी लिपीतील कागद पहावयास मिळतात. अशा या रंकभैरवाचे प्राचीन स्थानमहात्म्य खूप अलौकिक आहे. या श्री रंकभैरवास श्री महालक्ष्मी देवी ने आपले जवळ ठेवले आहे. तो हाती दंड घेऊन अहोरात्र प्रजेच्या रक्षणार्थ उभा आहे. प्राचीन ग्रंथ संदर्भानुसार एकदा मोठे अवर्षण पडले. प्रजेचे हाल सुरू झाले. उपासमार सुरू झाली. तेव्हा सर्व प्रजाजन श्री महालक्ष्मीस शरण गेले. श्री महालक्ष्मी देवीने पाताळ मार्गाने शुध्दाब्धीजल येथे आणून सोडले. त्या वेळेपासून या तीर्थाला शुध्दाब्धीतीर्थ असे नामाभिधान प्राप्त झाले. तीर्थाचे असुरा पासून रक्षण होणे आवश्यक होते म्हणून या तीर्थाच्या अष्ट दिशांना रक्षण करत्या अष्ट भैरवाची योजना श्री महालक्ष्मी देवी ने केली. या अष्टभैरवांपैकी एका भैरवाने या करवीर क्षेत्री कायमचे वास्तव्य करावयास मिळावे म्हणून उग्र आणि कठोर तपाचरण सुरू केले. त्यांच्या या तपश्चर्येने श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली तू आज पासून रंकभैरव म्हणून ओळखला जाशील. पातक करणाऱ्यांना शासन देणारा क्षेत्रपाळ होशील. तुझे हे तीर्थ रंकतीर्थ म्हणून विख्यात होईल. या शुध्दाब्धीच्या तटी तुझे लिंग असेल या रंकतीर्थ स्थानावर स्नान, दान, पिंड, तर्पण पूजा विधि करून अगस्ती आणि लोपामुद्रा हे लक्षतीर्था कडे निघाले असे संदर्भ ही जुन्या ग्रंथातून दिसून येतात. या रंकाळ्याच्या मधोमध छोटेखानी शिवलिंग स्वरूपात श्री रंकभैरव स्थान आहे. पण हे नेहमी बाराही महिने सतत पाण्यात असते यामुळे तलावाच्या काठी दर्शन स्थान महात्मे संध्यामठ रंकभैरव मंदिर उभारणी केलेली आहे. या तीर्थाचे अपभ्रंशात्मक बोलीभाषेत रंकालय, रंकाळा हे नाव रूढ झाले आहे. "रंकतीर्थमन्मध्यदेवालयेभैरवश्वततीर्थसाष्टादीक्षलिंगानिसंस्छाप्य | सष्ट भैरवा अंतगृहेदेव्या: दक्षिर्णोस्छितः रंकभैरवः" असे करवीर महात्म्यस्थतीर्थदेवता या प्राचीन ग्रंथांमध्येही संदर्भ आढळून येतात. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराशेजारी बिंनखांबी गणेश मंदिर नजीक श्री रंकभैरव यांचे मूर्ती रूपातील स्थान महात्म्य तर रंकाळा येथे लिंग स्वरूपातील स्थान महात्म्य आढळून येते.श्री रंकभैरव उत्सवादरम्यान रंक भैरव देवाची पालखीही येथे येत असते. कमळाचे आगार म्हणजे कोल्हापूर. या बरोबर हे रंकतीर्थ म्हणजे येथे असणारे जैवविविधतेने नटलेले पक्षितीर्थ हे सारं विलोभनीय आहे.नामा पक्षी, वारकरी, युरोशियन कुट, पांडू बी ,डुबक्या मारणारा पक्षी, जांभळी पाणकोंबडी,लाजरी पाणकोंबडी, वेडा राघू, भांगपाडी अशा एक ना अनेक पक्षी प्रजाती इथे एकवटल्या आहेत. या तलावास श्रीमंत छत्रपती महाराज सरकार यांच्या राजवटीत दगडी तटबंदीची जोड देत याचबरोबर राजवाड्यांचे बांधकाम करत या परिसरास रंकाळा चौपाटी चे स्वरूप प्राप्त झाले आहे. साधारण इसवी सन १८७७ ते १८८३ या कालखंडात श्रीमंत छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांनी चोपाटीचा तटबंदीचा भाग तर शालिनी पॅलेस चे बांधकाम १९३१ ते १९३४ या कालखंडात बांधण्यात आलेले आहे. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे ही वास्तु. चांदण्या रात्रीत या वास्तूचे प्रतिबिंब तलावात उमटते. हा एक अविस्मरणीय विलोभनीय क्षण असतो. रंकाळ्याच्या पश्चिमेस असणारा शालिनी पॅलेस म्हणजे पूर्व पश्चिम बाजू. यामुळे सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत च्या वातावरणात पाण्याच्या बदलत जाणाऱ्या छटा हा एक विलक्षण आनंद असतो. रसिक जनांसाठी पडणारी भुरळ यातून रंकाळा संध्यामठ आणि चित्रकला असं एक अतूट नात बनलं आहे. संध्यामठ ही एक सौंदर्य शाली वास्तूची एक बाब असली तरी प्राचीन काळातील वास्तू चा विचार करता ही वास्तू सतत नेहमी पाण्यामध्ये त्याचबरोबर सुटत चाललेले दगड,कमकुवत झालेला छताचा भाग, पायापासून निखळत चालेलेले दगड, याचबरोबर जलपर्णी, झाडाझुडपांचा प्रादुर्भाव, दोन दगडांमधील खोबनींचे सुटत चाललेले अंतर या बाबींचा विचार करता प्राचीन असणारे श्री रंकेश्वर तीर्थ स्थान संध्यामठ यांची जपणूक व संवर्धन कशी करतोय ही एक महत्त्वाची बाब बनली आहे. रंकाळा बचाव लोकसंस्कृतीक चळवळीला शासकीय बळ कसे मिळेल यावर हे अवलंबून आहे.असे असले तरी प्राचीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असणारे रंकभैरव स्थान महात्म्य दर्शवणारा संध्यामठ आज आपणास पहावयास मिळतोय ही सुद्धा आपल्या दृष्टीने खूप मोठी जमेची बाजू आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री रंकेश्वर- महादेव मंदिर. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव, कोल्हापूर, मोबाईल नंबर -९३७०१०१२९३.
श्री संध्येश्वर महादेव मंदिर.
श्री संध्येश्वर महादेव शिवपिंडी.
श्री संध्येश्वर महादेव आणि नंदी मूर्ती
 श्री संध्येश्वर महादेव मंदिरा शेजारी दरवाजात असणारे वीरगळ
 
श्री संध्येश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर, कोल्हापूर येथील प्राचीन स्थान महात्म लाभलेले विज्ञाननिष्ठ परंपरेतील मंदिर म्हणजे श्री संध्येश्वर -महादेव मंदिर . कोल्हापुरात हत्ती महाल, शिक्षण उपसंचालक कार्यालय, मटन मार्केट,फिश मार्केट येथे श्री त्रिसंध्येश्वर तर गुजरी भेंडे गल्ली शेजारील महादेव गल्ली येथे श्री द्विसंध्येश्वर तर रंकाळा संध्यामठ रस्त्याच्या शेजारी असणारे प्रिन्सेस पद्माराजे उद्यान गार्डन शेजारी हे श्री संध्येश्वर महादेव मंदिर दिसुन येते.येथे आता सध्या जी पद्माराजे उद्यान बाग दिसते ते पूर्वीच्या काळी संजाळ तळे होते. या प्राचीन तळ्याकाठी हे श्री संध्येश्वर महादेव मंदिर दिसून येते. मंदिर बारा बाय बारा दगडी एकपाकी उत्तराभिमुख आहे. मंदिरामध्ये पश्चिमाभिमुख शिवपिंडी आहे. याचबरोबर येथे छोटेखानी श्री नंदी मूर्ती तर तुटलेल्या अवस्थेतील विरगळ आढळून येतात. जुन्या प्राचीनतेची साक्ष देणारी विरगळ अस्थाव्यस पडलेले दिसून येतात.रंकाळ्यातील संध्यामठ मध्ये रस्ता तर बरोबर रस्त्याच्या पलीकडे हे श्री संध्येश्वर महादेव मंदिर दिसुन येते. या मंदिरापासून उद्याना पर्यंतचा भाग मोठमोठाली घरे बांधून व्यापून टाकला आहे. भव्य स्वरूपातील विस्तीर्ण बाग ते श्री संध्येश्वर मंदिर हे अंतर सर्व साधारण दोनएकशे फुटांचे आहे. यावरून प्राचीन काळी असणारे तळे याची व्याप्ती काय असेल याची कल्पना येते. खरेतर हे संजाळ-संध्याळ तळे म्हणजे शहराची जीवनदायिनी होते. आजच्या काळामध्ये जागतिक महामारी, प्रतिकारशक्ती ची कमतरता, ऑक्सिजन मध्ये येणारी घट या बाबी प्रकर्षाने दिसून येतात. अशावेळी हे संजाळ तळे म्हणजे अमृत कुंड म्हणून तिथे उभे होते. या तळ्याकाठी असणाऱ्या वनस्पती मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन यासाठी उपयुक्त ठरले होते. याचबरोबर अनेक वनस्पती अशा होत्या की, त्या पाणी शुद्ध करण्याचेच काम करायच्या. या वनस्पती मानवी जीवनासाठी आवश्यक असणारे सर्वच घटकांचा पुरवठा करत होते. नाईट्रेड म्हणजे वनस्पती आल्या पाहिजेत. कॅटलिस्ट काम करते पण स्वतः संपत नाही. अन्नामन्ना, पाण्यामध्ये नाईट्रेड असतात. अशा वनस्पती पाण्यामध्ये टाकल्या की, त्या वनस्पती पाण्यामध्ये ही जिवंत असतात. वाळा वनस्पती काय काम करतो यावर अजूनही संशोधन सुरू आहे. आयआयटी, प्रगत तंत्रज्ञान म्हणत असताना परत निसर्गा कडे जाण्यासाठी आजच्या गतिमान युगात वेळ नाही. वाळा ही वनस्पती आहे. जमिनीतून काढून ती पाण्यात टाकली तरी या वनस्पती ऑक्सिजन तयार करतात. आजच्या विज्ञानाला सुद्धा हे नवीन आहे. पाणी शुद्ध करणे याचबरोबर जमिनीच्या उगमाच्या पाण्यामध्ये चांगले गुणधर्म आहेत. याउलट समुद्राच्या पाण्यामध्ये छतीसहजार पाचशे पाचपा मिलीयम क्षार आहेत. यातील काहीच क्षार हानीकारक असतात. हे सर्व क्षार घातक नसतात. जे हानिकारक क्षार असतात त्यांची शुद्धता करून ते मानवी जीवनासाठी उपयुक्त करण्याची ताकद काही वनस्पतींमध्ये असते. निसर्गातून शिक्षण घेऊन त्यांचे रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज असताना फक्त डोळस दृष्टीने याकडे पाहण्याची गरज आहे.वाळा या वनस्पती प्रमाणेच शेवाळ ही वाळ्याप्रमाणेच वनस्पती आहे. शेवाळ म्हणजे सूक्ष्म आकारातून विविध आकारांमध्ये येणाऱ्या सूर्यप्रकाशात प्रकाश संलग्नाद्वारे अन्नाची निर्मिती करणारी वनस्पती. शेवाळ एकटे किंवा दुसऱ्या वनस्पती बरोबर ही सहजीवन करतात. शेवाळ यामध्ये अनेक प्रजाती आहेत. शेवाळ वनस्पतीत ए,बी आणि फायकोबिलि प्रोटीन असतात. यामुळे शेवाळ वनस्पती कडे अनेक पाश्चिमात्य देश अन्ननिर्मिती म्हणून पाहातात. शेवाळ वर्गीय एकपेशीय वनस्पती मानवी शरीरासाठी महत्त्वाची असल्याने असलेली कार्बोदके, प्रथिने ,जीवनसत्त्वे अ, ब ,क आणि ई तसेच लोह, पोटॅशियम ,मॅग्नेशियम, फॅल कॅल्शफॅल, मॅगनीज आणि झिंक भरपूर प्रमाणात आढळतात म्हणुनच शेवाळ अन्न म्हणुन वापरतात.जैव इंधनासाठी ही उपयुक्त प्रतिजैविक औषधे, सांडपाण्यातील जिवाणू मारण्यासाठी आणि ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी शेवाळ मदत करतात. अशा अनेक वनस्पती या संजाळ तळ्याच्या काठी होत्या. मानवी जीवनासाठी उपयुक्त असणारी ही निसर्गसंपदा हा एक असीम शक्तीचा भाग यामुळे त्यांचे स्मरण म्हणून या प्रत्येक तळ्यांच्या, कुंडा शेजारी प्राचीन मंदिरे दिसुन येतात. विज्ञाननिष्ठ परंपरेतील भाग गळुन पडल्यामुळेच आजच्या बदलत्या परिस्थितीत या तळ्यांच्याजागी अतिक्रमणे,घरे, इमारती बाग-बगीचे झाली आहेत. यामुळे या तळ्याकाठी असणारी ही मंदिरे एकाकी पडले आहेत. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे म्हणत असताना मानवी जीवन शैली साठी अत्यंत उपयुक्त असणारी ही मंदिरे यातील विज्ञान दृष्टी या बाबी आजच्या काळात नव्याने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. शरीर बलोपासनेसाठी व्यायाम शाळा, तालीम संस्था दिसून येतात तर शरीर की फक्त नाण्याची एक बाजू आहे तर नाण्याची दुसरी बाजू म्हणजे मन ही आहे. या मन उपासनेसाठी ही मंदिराची रचना दिसून येते. मानवी जीवनासाठी उपयुक्त असणार्या या मंदिरांचा प्राचीन काळी पद्धतशीरपणे निसर्गाशी समतोल राखून अभ्यास केलेला दिसून येतो. दक्षिण काशी शेत्र करवीर,कोल्हापुर येथे अशा मानसिक मन उपासनेसाठी अनेक मंदिरांची निर्मिती केलेली दिसून येते. यापैकीच एक म्हणजे रंकाळा, रंकालय, संध्यामठ शेजारी असणारे हे श्री संध्येश्वर - महादेव मंदिर. उदयसिंह राजेयादव-कोल्हापुर - मोबाईल नंबर.-९३७०१०२०९३.
 
श्री नंदीश्वर रंकेश्वर महादेव मंदिरातील श्री नंदी मूर्ती.
श्री नंदिश्वर- रंकेश्वर महादेव शिवपिंडी.
श्री नंदेश्वर रंकेश्वर महादेव मंदिरं.
श्री नंदीश्वर- रंकेश्वर महादेव शिवपिंडी.
श्री नंदीश्वर रंकेश्वर महादेव मंदिरा शेजारी असणारे पादुका दगडी शिल्प.
 
श्री नंदीश्वर - रंकेश्वर महादेव मंदिर ;- कोल्हापुरातील रंकाळा, रंकाळा चौपाटी, राजघाट रोड शेजारीच असणारे, प्राचीन स्थान महात्मे लाभलेले मंदिर म्हणजे श्री नंदीश्वर- रंकेश्वर महादेव मंदिर. कोल्हापूर हद्दवाढ हा मुद्दा दिवसेंदिवस किती वेग घेत आहे हे जुने संदर्भ तपासता आपल्याला दिसून येते. कोल्हापूर प्राचीन काळी असणारी करवीरची मर्यादित लोकवस्ती,त्याला जोडूनच असणारी हि खेडी हा अभ्यास करताना दिसून येते. आज रंकांळा हा शहराचा मध्यवस्तीत चा भाग असला तरी रंकाळा हि एक लोकवस्ती जुने खेडे होते. सध्या प्रचलित असणारा शिवाजी पेठेचा भाग हा सुद्धा नवा बुधवार वसाहत या नावानेच ओळखला जायचा. या शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक ते रंकाळा कडे जाणाऱ्या मार्गास राजघाट रोड म्हंटले जाते. या राजघाट रस्त्यालगतच्या छोट्या बोळामध्ये हे श्री नंदीश्वर- रंकेश्वर महादेव मंदिर आहे. हे एकमेव असे मंदिर आहे की, या मंदिरामध्ये नंदी मंदिरामध्ये आणि भगवान शंकर- शिवपिंडी मंदिराबाहेर असे हे आगळेवेगळे मंदिर आहे. वीस बाय वीस नंदी मंडप गाभारा दगडी एकपाकी यामध्ये सर्वसाधारण दहा फूट रुंदी तर पाच फूट उंची अशा भव्य स्वरूपातील नंदी मूर्ती येथे दिसून येते. या नंदी मंदिरासमोर पाच फुटाचे भव्य शिवलिंग आहे. या शिवलिंगा शेजारी आणखीन एक छोटे शिवलिंग पहावयास मिळते. नंदी मंदिरात शिवलिंग उघड्यावरती ही बाब शिवभक्तांच्या पचनी न पडल्यामुळे तसेच पावसाळ्यात वगैरे शिवपिंडीची पूजा सुद्धा करता येत नसे या बाबी गृहीत धरून अलीकडील काळात या जुन्या नंदी मंदिरासमोर असणाऱ्या भव्य शिवपिंडीस वीस बाय वीस स्वरुपातील आर.सी.सी. एकपाकी मंडप वजा खोली बांधून मंदिराचे स्वरूप दिले आहे. या भव्य स्वरूपातील नंदी मुळे अनेक कथा, दंतकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. भगवान शंकर पार्वती करवीर क्षेत्री, वडणगे येथे आले असता शिव परिवारातील नंदी ही करवीर नगरीत आले होते. भगवंतानी श्री नंदीस नदी ची शिव ओलांडून जाऊ नको अशी आज्ञा केली होती., पण हिरवागार चारा आणि निसर्गरम्य परिसर पाहून भटकत श्री नंदीराज इथे येऊन पोहचले व पुन्हा भगवंतांकडे जाण्याच्या दृष्टीने भगवंतांचे स्मरण केले ते स्थान म्हणजे हे श्री नंदीश्वर मंदिर स्थान होय. याचबरोबर दरवर्षी एक गहूभर नंदी पुढे सरकतोय आणि तीळभर मागे सरकतोय आणि असा सरळ रंकाळा- रंकतीर्थ येथे नंदिराज पोहचतील यावेळी जगबुडी होणार अशा एक ना अनेक कथा या मंदिराविषयी प्रचलित आहेत. असे असले तरी प्राचीन स्थानमहात्म ग्रंथांमध्ये ही या रंकेश्वर -श्री नंदीश्वर महादेव मंदिराचा संदर्भ आढळून येतो. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदीरातील मणिकर्णिका तीर्थकुंड काठी श्री घळसासी यांच्या दरवाजा पुढे ही श्री नंदिकेश्वर मंदिर दिसुन येते. या रंकाळ्याजवळील श्री नंदीश्वर मंदिरामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने श्रद्धापूर्वक सण उत्सव साजरे करताना दिसतात. श्री नंदी हे शिवगणातील एक वाहन मानले जाते. नंदीचे महत्व सांगणारे नंदी पुराणच धर्मशास्त्रात उपलब्ध आहे. श्री नंदी यांना काम शास्त्राची देवता म्हणून ही मानले जाते. संस्कृतमध्ये नंदी या शब्दाचा अर्थ प्रसन्नता ,आनंद असा होतो. नंदी या देवतेस शक्ती ,संपन्नता ,करमठतः याचे प्रतीक मानले जाते. शैव संप्रदायामध्ये नंदी नाथ संप्रदाय म्हणून एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायातील आठ शिष्यांना आठ दिशांना शैव संप्रदायाच्या प्रसारार्थ पाठवले होते. सनक, सनातन, सनंन्दन ,सनत्कुमार,तिरूमुलर, व्याघ्रपाद, पतंजली आणि शिवयोग अशी त्यांची नावे होती. नंदी भक्ती, नंदी आराधना हे ही एक शास्त्र आहे. कोणतीही बाब प्रथम भगवान शंकर महादेवांना सांगण्यापेक्षा ती जर श्री नंदी नां सांगितली तर ती बाब लगेच पूर्णत्वास जाते. यामुळे अनेक भाविक नंदी उपासना करताना दिसतात. या दृष्टिकोनातून या श्री नंदीश्वर मंदिराचे महत्त्व प्राचीन काळापासून आतापर्यंत दिसून आले आहे. असे हे दक्षिणकाशी क्षेत्र करवीर ,कोल्हापूर येथील श्री नंदीश्वर- रंकेश्वर - महादेव मंदिर.
श्री कपोतेश्वर महादेव मंदिर गर्भगृह
श्री कपोतेश्वर महादेव शिवपिंडी.

श्री कोपोतेश्वर मंदिर अंतगृह हेमाडपंथी शैली शिखर रचना.
श्री कपोतेश्वर महादेव मंदीर प्रवेश दारावर बसवण्यात आलेली संगमरवरी फरशी.
श्री कपोतेश्वर मंदिर जीर्णोद्धार फलक.
श्री कपोतेश्वर मंदिर गर्भगृह देवडी-दिवळी.
 
श्री कपोतेश्वर - महादेव मंदिर :- कोल्हापूर दक्षिण काशी क्षेत्र करवीर कोल्हापूर येथील विलोभनीय पण प्रसिद्धीपासून दूर असलेले असे हे महादेव मंदिर म्हणजे श्री कपोतेश्वर - महादेव मंदिर. कोल्हापूर करवीर संस्थानच्या राजवटीतील मनसबदार, अधिकारी म्हणजे भिमबहाद्दूर - माने तसेच फडणीस- फडणविस.कोल्हापुरातील महाद्वार रोड वरील सध्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची इमारत मध्ये रस्ता या रस्त्याच्या बरोबर समोरील बाजूस कागल सांगाव येथील भिमबहादुर माने यांचा वाडा होता. या भिमबहादुर माने यांच्या वाड्याच्या मागील बाजूस फडणवीस यांचा वाडा होता. प्रत्यक्ष लढाया, स्वाऱ्या, युद्ध प्रसंगी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन राजा तसेच राज्याचे प्रमुख अधिकारी यांच्यापर्यंत जाऊन वार्तांकन,बातमीदारी करणे म्हणजे फडणीस. लढाईच्या युद्ध मैदानावर प्रत्यक्ष जाऊन वार्तांकन- बातमीदारी करणे हे खूपच जोखमीचे काम असे यावेळी राजा महत्त्वपूर्ण कामगिरीस्तव मानाची वस्त्रे प्रधान करत असत अशा व्यक्तींना फडणवीस असे म्हटले जात असे. अशा या फडणवीस वाड्याच्या मागील बाजू, परसु अंगणात हे श्री कपोतेश्वर महादेव मंदिर होते. आत्ता सध्याची भेंडे गल्ली, सराफ व्यापारी दुकान ओळ,भेंडे गल्ली पोस्ट ऑफिस लगतच असणाऱ्या फडणीस भट यांच्या निवासस्थानाची तब्दीली होऊन ही वास्तू दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग संस्थेचे अनेक वर्ष संचालक असणारे श्री पेडणेकर यांच्याकडे आहे. प्राचीन दगडी मनमोहक मंदिर पण मुख्य रस्त्याच्या लगत घरे,इमारती आणि या इमारतीच्या आतील बाजूस हे मंदिर असल्यामुळे हे मंदिर अनेकांना अनभिज्ञच आहे. संपूर्ण आयुष्य कोल्हापुरात काढलेल्या व्यक्तीनांही श्री कपोतेश्वर महादेव मंदिर कोठे आहे असे विचारले तर पटकन सांगता येणार नाही अशी या मंदिराची अवस्था आहे. त्यातच पेडणेकर यांच्या मागील बाजूस आठ-दहा पायऱ्या खाली उतरून तळघरात गेल्याप्रमाणे या मंदिरात जावे लागते. बारा बारा दगडी एकपाकी गर्भगृह तर दहा बाय दहा दगडी एकपाकी नंदीमंडप असे मंदिराचे स्वरूप आहे. कोरीव नक्षीकाम असलेल्या नंदीमंडपात सध्या येथे श्री नंदी मूर्ती दिसून येत नाही. सुंदर कोरकीपणा,गर्भगृहात पूजा साहित्य ठेवण्यासाठी केलेली दगडी देवडी व्यवस्था, विलक्षण गारवा हे सर्व मंत्रमुग्ध करणारे, विलोभनीय असेच आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस तसेच पुढील बाजूस तसेच जमीन पातळीवर संगमरवरी फरशी बसवून शिवानंद के भट, मोहनराव के भट यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. शिवपिंडीचा आकार, लिंगाचा बसकेपणा अशा वेगळ्याच धरतीची शिवपिंडी येथे पहावयास मिळते. देवगिरी नरेश सम्राट सिंघणदेव यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीतील हे मंदिर आहे. गर्भगृहामध्ये ध्यान, ओंकार साधनेसाठी बसले असता एक वेगळीच अनुभूती देणारे हे मंदिर आहे. कपोतेश्वर- कपोत म्हणजे कबूतर.या संदर्भात असे सांगितले जाते की, एकदा भगवान शंकर अमरत्वाची कथा पार्वती मातेस सांगत होते. ही कथा जो कोणी ऐकेल तो अमर होईल यामुळे आपल्याच परिवारातील असणारे श्री नंदी ,श्री नागराज, श्री गणेश यांना दूर ठेवून भगवान शंकर पार्वती मातेस अज्ञात स्थळी घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर भगवंत कथा सांगू लागले. कथा सांगण्या मध्ये भगवंत तल्लीन झाले होते पण अशावेळी पार्वती मातेस ग्लानी आली. यावेळेस त्या ठिकाणी दोन कबुतर होते ते हुंकार देत होते. यामुळे भगवंत यांना वाटत होते की, पार्वतीच कथा ऐकत आहे. कथा संपूर्ण सांगून झाल्यानंतर देवी पार्वती च्या शेजारी कबुतरांना पाहताच भगवान क्रोधाविष्ट झाले. पण यावेळी कबुतरांनी विनंती केली. हे भगवंत आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आम्ही तुमचे परम भक्त आहोत. आणि तुम्हीच म्हणाला होता की,ही कथा ऐकणाऱ्यांना अमरत्व प्राप्त होईल. भगवंत आमच्यावर कृपा करावी. या वेळी भगवान शंकर प्रसन्न होऊन म्हणाले की जेथे तुमचे स्थान असेल तेथे माझा अखंड वास असेल असा वर दिला. असे हे कपोत क्षेत्र स्थानमहात्म्य म्हणजे श्री कपोतेश्वर महादेव मंदीर आहे. असे हे दक्षिणकाशी क्षेत्र करवीर कोल्हापूर येथील श्री कपोतेश्वर- महादेव मंदिर.
श्री महाकाली देवीची बांधलेली सालंकृत पूजा.
श्री ककोटकेश्वर मंदिर गाभाऱ्यातील श्री रासाई देवी.
श्री ककोटकेश्वर महादेव मंदिरातील श्री नंदी मूर्ती.
श्री ककोटकेश्वर महादेव शिवपिंडी.
श्री महाकाली देवी समोरील मंडप.

श्री ककोटकेश्वर महादेव मंदिरातील श्री शेषनाग महादेव मूर्ती.

श्री महाकाली मंदिर.
श्री ककोटकेश्वर मंदिर गाभाऱ्यातील शिखर अंतर्ग्रह ही रचना.
 श्री ककोटकेश्वर महादेव मंदिर.
 
श्री ककोटकेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर, कोल्हापूर, शिवाजी पेठ, उभा मारूती चौक,साकोली कॉर्नर येथील श्री महाकाली मंदिर शेजारी पश्चिम बाजूस असणारे जुने देऊळ म्हणजे हे श्री ककोटकेश्वर-महादेव मंदिर. कोल्हापुरातील शिवाजी पेठेची ओळख म्हणजेच हे श्री महाकाली मंदिर होय. मानवी जीवन सृष्टीस लय देणारी देवता, तामस गुण, रुद्र स्वरूपिणी, महाकाल यांची शक्ती म्हणजे श्री महाकाली देवता होय. मधुकैंठ राक्षसाला मारण्यासाठी श्री ब्रह्मदेवांनी श्री महाकाली देवीची करुणा केली. यावेळी देवी प्रगट होऊन दैत्यांचा संहार केला. बंगालमध्ये या देवीचे मूळ स्वरूप दिसून येते. नाग पंथीय, नागा लोकांचेही ही प्रमुख देवता आहे. श्री महाकाली देवी स्थान महात्म्य वर्णन श्री करवीर महात्म्य या ग्रंथांपासून अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये दिसून येते. श्री महालक्ष्मीच्या आश्रयास नागराज आले असता श्री महालक्ष्मीने त्यांना अभय दिले. नागांची गरळ जेथे पडली तेथे विषकुंड नावा चे तसेच महाकाळ कुंड प्रसिद्ध झाले आहेत. या कुंडामध्ये श्री महाकाली देवी ने स्वहस्ताने अमृत घातल्याने त्या कुंडाचे जल अमृतापम झाले. या ठिकाणी नाग परम संतोषी राहिले यामुळे या अमृत कुंडा शेजारी आणखी एक तीर्थकुंड तयार झाले. स्वतः नागांनी केलेली लिंगपूजा यामुळे या श्री नागेश्वर स्थानास ककोटकेश्वर महादेव मंदिर असे नामाभिधान रुढ झाले आहे. प्रत्येक तीर्थकुंड यांचे विविध फलदायी गुणदर्शन जुन्या ग्रंथातून दिसून येते. येथील परिवार देवतांची मुख्य देवता श्री महाकाली देवी ही आहे. श्री महाकाली देवीचे भव्य स्वरूपातील एक पाकी दगडी प्राचीन मंदिर येथे दिसून येते. हेमाडपंथी वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कोरीव काम या मंदिरातून आढळून येते. गर्भगृह, कासव मंडप,सभामंडप असे मंदिराचे स्वरूप आहे तर मंदिरासमोर निरनिराळे उत्सव, कार्यक्रम लक्षात घेतात पत्र्याचे शेड असणारे असणारा भव्य मंडप उभा करण्यात आला आहे या मंडपाच्या पश्चिम बाजूस श्री महाकाली तालमीची ही भव्य इमारत दिसून येते. आर.सी.सी. उभारण्यात आलेल्या तालमीत ही श्री गजानन, हनुमान अशी मंदिरे दिसून येतात. या तालीम इमारती शेजारी छोट्या बोळालगत हे श्री ककोटकेश्वर महादेव मंदिर आहे. श्री महाकाली चे दर्शन घेऊन परिवार देवतांचे दर्शन घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. महाकाली मंदिरातील श्री महाकाली देवीची मूर्ती तीन फूट उंचीची काळ्या पाषाणातील सर्वांगसुंदर मूर्ती आहे. श्री देवीचे विविध उत्सव पालखी परिक्रमा मोठ्या उत्साहात होत असतात. श्री महाकाली देवी, श्री ककोटकेश्वर महादेव, श्रीदत्त, हनुमंत तसेच नागपंथी सिद्ध पुरुषांच्या दगडी समाधी ही येथे दिसून येतात. या महाकाली मंदिराशेजारी असणारे हे श्री ककोटकेश्वर मंदिर ही तितकेच जुने प्राचीन आहे. पंधरा बाय पंधरा दगडी एकपाकी गाभारा तर समोर बारा बाय बारा दगडी नंदीमंडप आहे. शिखरही हेमाडपंती अंतरगृही शैलीचे छोटेखानी स्वरूपाचे आहे. एकंदर एवढेच मंदिराचे स्वरूप.मंदिरावरील शिखरांची डागडुजी तसेच मंदिरा मध्ये संगमरवरी मार्बल फरशी बसवून याचबरोबर नंदीमंडपास लोखंडी रेलिंग करून मंदिर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरामध्ये श्री हनुमान, श्री रासाई देवी,श्री शेषनाग ,छोटी शिवपिंडी मूर्ती गाभार्यात एक सलग अनुक्रमे दिसून येतात. या देव मूर्ती यांच्या समोर मुख्य मोठी श्री ककोटकेश्वर शिवपिंडी खूपच प्राचीन असून या श्री ककोटकेश्वर पिंडी समोरील श्री नंदी मूर्तीही खूपच सुंदर आहे. श्री ककोटकेश्वर हे मुख्य श्री नागराज यांचे स्थान महात्म्य तीर्थक्षेत्र मानले जाते. यामुळे अनेक भाविक या श्री ककोटकेश्वर महादेव शिवपिंडीस श्री नागेश्वर म्हणूनही भक्तिभावाने पूजन करतात. यामुळे नागराजांचे स्मरण करण्याच्या दृष्टीने श्री महाकाली देवी तसेच श्री ककोटकेश्वर शिवपिंडी शेजारीही नाग शिल्पा द्वारे स्थान महात्मे महत्त्व दर्शवले आहे. असे ही दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री ककोटकेश्वर- महादेव मंदिर.
नागाळेश्वर परिसरातील झाडाखाली असणारे श्री हनुमान मूर्ती, तसेच तुटलेल्या स्वरूपातील वीरगळ.
श्री नागाळेश्वर मंदिरासमोरील झाडी.
नागाळा पार्क येथील श्री नागाळेश्वर मंदिरातील नाग शिल्पे.
श्री नागाळेश्वर - नागेश्वर.
श्री नागाळेश्वर मंदिरासमोरील दिसणारी झाडी.
श्री नागेश्वर,नागाळेश्वर मंदिर.
श्री नागाळेश्वर मंदिरासमोरील श्री नंदी मूर्ती.
 
श्री नागाळेश्वर ;- प्राचीन काळापासून आजतागायत काही स्थानमहात्म्य क्षेत्रे जसे आहेत तशीच आजतागायत जपली आहेत,त्यापैकीच एक म्हणजे श्री नागाळेश्वर, नागेश्वर,नागोबा- महादेव मंदिर. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय (कलेक्टर ऑफिस) या शेजारील सर्व परिसर म्हणजे नागाळा पार्क म्हणून ओळखला जातो. सध्याचे जिल्हा परिषद कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत याच्या समोर जुनी जिल्हा परिषद कार्यालयाची इमारत म्हणजे श्रीमंत छत्रपती महाराजा करवीर कोल्हापूर यांचे सेमीट्री संस्थान कागल चे अधिपती घाटगे सर्जेराव वजारतमाब,सरकार यांची राजवाड्याची वास्तु कागलकर हाऊस. पूर्वीच्या काळात हा सर्व परिसर रिकामा ,भरपूर प्रमाणात झाडी असा होता. यामध्ये दोनच क्षेत्रे सर्वतोपरी परिचित होती. यातील एक म्हणजे कागलकर हाऊस, कागलकर राजसाहेबांचा राजवाडा आणि दुसरी म्हणजे या वस्तू पासून थोड्याच अंतरावरील घनदाट झाडीत असणारे श्री नागोबा- नागाळेश्वर मंदिर.आजच्या काळातही थोड्याफार प्रमाणात का होईना या मंदिराची प्राचीन मंदिरासारखीच अवस्था आहे. जिल्हा परिषद रस्त्या कडून महावीर कॉलेज मार्गाच्या रस्त्यावर अगदी थोड्याच अंतरावर उजव्या बाजूस हे नागाळेश्वर मंदिर आहे.आजच्या काळात सुद्धा भरपूर झाडी, शांत निसर्गरम्य परिसर येथे अनुभवास मिळतो. जुने मंदिर पाच बाय पाच या आकारातील तर उंचीही जेमतेम तेवढीच असे मंदिराचे छोटेखानी स्वरूप आहे. मंदिरामध्ये दोन फूट उंचीच्या प्रणयकारी नाग जोडीच्या दोन दगडी शिळा येथे आहेत आणि एक दगडी नाग प्रतिमा अनुसरून शिल्पही आहे. याच्या समोर अगदी छोटेखानी शिवलिंग पिंडी आहे. मंदिराच्या बाहेर उघड्यावरच श्री नंदी मूर्ती दिसून येते. आसपास असणाऱ्या झाडीमध्ये तुटलेल्या अवस्थेतील दगडी यादवकालीन वीरगळ येथे दिसून येतात. यामध्ये ही वीर योद्धा शिवलिंग पूजन करत आहे अशी ही वीरगळ शिल्पे आहेत. सभोवताली झाडी यास बागेचे स्वरूप देत दोन चार प्रकारचे झोपाळे हे ही येथे बसवण्यात आले आहेत. मंदिराशेजारीच दक्षिण बाजूस आर.सी.सी. एकपाकी खुला सभामंडप उभा करण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश योगाभ्यास, प्राणायाम हा असून हे योगा वर्ग निशुल्क व सेवाभावी वृत्तीतून गेली अनेक वर्षे सातत्यातून घेण्यात येत आहेत. प्राचीन काळातील योगसाधना याचा वसा आणि वारसा इथे दिसून येतो. दक्षिण काशी क्षेत्र करवीर असे म्हणत असताना नागाळा या परिसराचे महत्व स्थानमहात्म्य अनेक ग्रंथातून दिसून येते. क्रोशांतो नागतीर्थलिंगच नागाश्व जिवंत्या:पूर्वर्तः नागाळ असे संदर्भ करवीर महात्म्यस्थतीर्थदेवता या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळून येतात. कोल्हापुरात नाग कसे आले. नागांवर महालक्ष्मी कशी प्रसन्न झाली. नागांचे स्थानमहात्म्य अशी वर्णने करवीर महात्म्य या ग्रंथातील बारा,तेरा,चौदा अशा अध्यायातूनही दिसून येते. नाग गरुड यांच्या भयाने भूमिगत मार्गाने करवीरात आले. स्नान, विश्वेश्वराधी लिंग पूजन करून श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आले. सिंहासनाधीश्वर महालक्ष्मीचे दर्शन घेऊन नाग संतुष्ट झाले आणि म्हणाले, हे देवी आम्ही तुझ्या दर्शनाने संतुष्ट झालो आहोत. तुझ्या नगरात आमचे चिरकाल वास्तव्य व्हावे, तसेच गरुड भयापासून रक्षण कर. देवी संतुष्ट होऊन तथास्तू म्हणाली.जेथे जेथे तुमचे वास्तव्य होईल तेथे तुमच्या नावाचे तीर्थ कुंड तयार होईल. यानंतर नागराज करवीर चे पूर्वेस एक हा कोसावर जाऊन राहिले. ते नागाळा म्हणून प्रसिद्ध झाले. या ठिकाणी नागांचे वास्तव्य आणि नाग तीर्थ कुंड निर्माण झाले. ज्या ठिकाणी नागांचे वीष पडले ती स्थाने नाग स्थाने म्हणून ओळखली जातात.यामुळे या स्थानास नागाळा तसेच श्री नागाळेश्वर म्हणून ख्याती प्राप्त झाली आहे. नागाचे लिंग पूजन याला विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळी या नाग कुळाचे मूळ नाग नागराज वासुकी यांनी लिंग पूजन केल्याचे आढळून येते. भगवान श्री शंकराच्या गळ्यात गुंडाळलेल्या नागाचे नावही वासुकीच आहे. या वासुकी नावाच्या नागराजांच्या वडिलांचे नाव ऋषी कश्यप तर आईचे नाव कटू हे होते. वासुकी नावाच्या नागराजांच्या मोठ्या भावाचे नाव शेष- अनंत तर इतर भावांचे नाव पिंगळा,तक्षक,ककोटक हे होय.शेषनाग -अनंत हे श्री महाविष्णु यांचे सेवादार तर वासुकी हे महादेवांचे मोठे भक्त होते. महादेवांनी वासुकीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना भगवान शंकरांनी वासूकीस आपल्या गळ्यात समाविष्ट केले आहे.वासुकीची लिंगपुजन शिवभक्ती या कारणामुळेच नाग जातीच्या लोकांनी सर्वप्रथम लिंग पूजन सुरु केले. वासुकीनेच कुंतीपुत्र भीमाला दहा सहस्त्र हत्तींचे बळ प्राप्त करून दिले होते.जेव्हा भीमाला दुर्योधनाने फसवून विष पाजुन गंगेत फेकून दिले होते, तेव्हा भिम नाग लोकात पोहोचले. तेथे भिमाच्या आजोबांनी वासुकी ला सांगितले की हे कोण आहेत. तेव्हा वासुकी नागाने भीमाचे विष काढून घेतले आणि त्याला दहा सहस्त्र हत्तींचे बळ दिले. वासुकीच्या डोक्यावरच नागमणी होत असे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांना कंसाचा तुरुंगातून गपचूप रित्या वासुदेव गोकुळास नेहत होते तेव्हा वाटेत जोरदार पाऊस सुरू झाला या पावसातून आणि यमुनेच्या पुरापासून वासुकी नावाच्या नागानेच श्रीकृष्णाचे रक्षण ,दर्शन केले होते. अशा या वासुकी नागाच्या रूपानेच समुद्रमंथनाच्या वेळीही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. वासुकी नावाच्या नागराजांपासून श्री महादेवांची लिंग पूजा सुरू झाली असे नागा समाजातील सर्व जणांची समजूत आहे. असे हे नागांनी लिंग पूजन केलेले स्थान म्हणजे नागाळेश्वर. स्वतः नागांनी केलेले लिंग पूजन यामुळे या नाग स्थानास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे तसेच प्राचीन स्थानमहात्म्य अनुषंगानेच कोल्हापूर परीसरात, शहरात ,कोल्हापूर बाहेरही नाग तीर्थकुंड ,नागेश्वर मंदिरे पहावयास मिळतात. या प्राचीन काळातील नागवस्ती च्या नोंदी आहेत त्यामुळेच नागपंचमी, महाशिवरात्र ,श्रावण सोमवार अशा वेळी अनेक भाविक श्री दर्शन पुण्यफलदायक समजतात. मंदिर छोटेखानी असले तरी जुनी धार्मिकता प्राचीनता आजही श्री नागाळेश्वर- महादेव भक्तांनी जपलेली दिसून येते. असे हे स्थान महात्म पोथी मध्ये ही वर्णन असलेले,तसेच प्राचीन ,धार्मिक, ऐतिहासिक ग्रंथांमध्ये नमूद असलेले मंदिर म्हणजे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री नागाळेश्वर- नागेश्वर -नागोबा -महादेव मंदिर.
श्री विघ्नेश्वर -सोमेश्वर- महादेव शिवपिंडी तसेच श्री नंदी मूर्ती.
श्री विघ्नेश्वर- सोमेश्वर- महादेव मंदिर.

श्री विघ्नेश्वर- सोमेश्वर- महादेव मंदिरातील श्री विघ्नेश्वर -सोमेश्वर श्री नंदी मूर्ती.
श्री विघ्नेश्वर -सोमेश्वर- महादेव मंदिराशेजारील तुळशीवृंदावन तसेच श्री महादेव शिवपिंडी.
श्री विघ्नेश्वर, श्री गजानन गणेश मुर्ती.
श्री विघ्नेश्वर -सोमेश्वर -महादेव मंदिरातील छताची आतील बाजू.
 श्री विघ्नेश्वर तसेच श्री नंदी मूर्ती.
जमीन सपाटीपासून श्री विघ्नेश्वर- सोमेश्वर मंदिरास येण्यासाठी असणाऱ्या दगडी पायऱ्या.
 
श्री विघ्नेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर म्हणजे डाकवे गल्ली, सिद्धाळा बाग,मंगळवार पेठ येथील श्री विघ्नेश्वर- सोमेश्वर- महादेव मंदिर. जुन्या काळचा विचार करता मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर पुढील सर्व भाग शेतवट,तळे, दलदल असाच होता. किरकोळ लोकवस्ती, ही वस्ती ही खूप धाडसानं इथे रहात होती. कारण हा भाग भुताचा परिसर म्हणूनच ओळखला जात होता. आता सध्याचे महानगरपालिकेचे नेहरू उद्यान-सिद्धाळा बाग प्राचीन काळातील सिद्ध तीर्थ,तीर्थ कुंड तळे.श्री सिध्देश्वर मंदिर तसेच त्याला लागून असणारे श्री महादेव मंदिर म्हणजे श्री सोमेश्वर मंदिर येथे खूप धाडसाने जंगम लोक राहत असत. या सिद्धाळा तीर्थ कुंडा शेजारीच आणखीन एक तीर्थकुंड तळे होते. हे तीर्थकुंड म्हणजे विघ्नविनाशनं तीर्थ. सिद्धाळा तळ्याच्या एका बाजूला श्री सोमेश्वर, श्री सिद्धेश्वर तर तळ्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला श्री विघ्नेश्वर. इथल्या तळ्यास मुबलक पाणी, दलदल,शेतवट परिसर यामुळे येथे पूर्वी भात शेती केली जायची. आजच्या भर,दाट लोकवस्तीमध्ये भातशेती हे सांगून सुद्धा पटणार नाही. पण चव्हाण कुटुंबीय भात शेती मोठ्या आपुलकीने करत. यामुळे जुन्या काळातील व्यक्ती, जाणकारांकडून चव्हाण मळा,चव्हाण तळे अशाच बाबी पहावयास मिळतात. आजच्या काळात घराला घर असे लागून घरे असा हा दाट लोकवस्तीचा भाग बनला आहे. डाकवे तसेच मोरबाळे यांचे अनेक बुडके,घरे इथे असल्यामुळे येथील गल्लीला ही डाकवे गल्ली, मोरबाळे गल्ली अशीच नावे पडली आहेत. सिद्धाळा बागेच्या पाठीमागील बाजूस अग्नेय दिशेला ही डाकवे गल्ली आहे. चौका पासून तीन चार घरे सोडताच पश्चिम बाजूला कसबा बीडचे पाटील यांची मिळकत आहे. या मिळकतीत हे मंदिर आहे.अपार्टमेंट च्या जमान्यात अनेक मंदिरे इतिहास जमा झालेली आहेत. पण इथे मात्र प्राचीन मंदिर जसेच्यातसे ठेवून आर.सी.सी. भव्य इमारत उभा केली आहे. बेसमेंट तळघरात हे मंदिर असून सुद्धा पूर्वीचे तीर्थकुंड,तळे या बाबींचा विचार करता साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी विद्युत पंप व्यवस्था ,स्वच्छता अशा बाबी सुंदर रित्या सांभाळत मंदिर खूपच सुंदर ठेवले आहे. बारा बारा दगडी एक पाकी, शिखरही दगडी असे मंदिराचे स्वरुप .मंदिरात जाण्यासाठी जमीन सपाटीपासून पाच सात पायऱ्या उतरून या मंदिरात जाता येते. मंदिरामध्ये श्री नंदी, शिवपिंडी तर पाठीमागील भिंतीवरील कोनाड्यांमध्ये श्रीगणेश- विघ्न विघ्नेश्वर मूर्ती आहे. सोमवार हा श्री महादेवाचा वार तसेच सोम म्हणजे चंद्र देव हे श्री महादेवाचे मुकुटमणी, नेहमी डोक्यावर धारण केलेले असल्यामुळे अनेक महादेव मंदिरांना श्री सोमेश्वर म्हणण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.यामुळे श्रद्धा भावनेतून अनेक भाविक या मंदिरास श्री सोमेश्वर असेही संबोधतात. पण करवीर क्षेत्रातील श्री सोमेश्वर मंदिर श्री सिद्धेश्वर मंदिराशेजारी जंगम कुटुंबियांच्या वहिवाटीत आहे.करवीर महात्म्य जुन्या ग्रंथांच्या संदर्भानुसार हे श्री विघ्नेश्वर मंदिर आहे. दैव शक्ती या ब्रम्हांडात्मक आहेत. ब्रह्मांडामध्ये सत्तेची सात स्तर आहेत. सत्य, तप,महर,मनो,आनंद, प्राण,स्तुल लोक असेच सात स्तर आढळून येतात. महा तत्त्व म्हणजे ब्रम्हांडीय मन.सर्व जण गण आणि गणांची देवता म्हणजे श्री गणेश. अज्ञानरूपी अंधकार दूर करण्यासाठी, अनेक विघ्ने दूर करण्यासाठी श्री गजानन या देवतेस प्राचीन शास्त्रानुसार महत्त्व दिले आहे. गणेश पुराण, मुद्गगल पुराण ,स्कंद पुराण ,विनायक पुराण अशा अनेक प्राचीन ग्रंथात श्री विघ्नेश्वर महात्म्य आढळून येते.राजा अभिनंदन यांनी तिन्ही लोकांवर विजय मिळवण्यासाठी एक यज्ञ सुरू केला. त्यामुळे इंद्रपद धोक्यात आल्यामुळे श्री इंद्र देवांनी विघ्नासूर नावाच्या राक्षसाची उत्पत्ती केली.यामुळे विघ्नासूर यज्ञामध्ये प्रचंड अडथळे आणण्यास सुरूवात करून त्रास देऊ लागला.यावेळी सर्व ऋषी-मुनी यांनी श्रीगणेशाची आराधना,गणेश विनंती करण्यास सुरुवात केली.यावेळी श्री गणेश साक्षात प्रकट होऊन विघ्नेश्वरा चा पराभव केला.यावेळी विघ्नासूर राक्षस श्री गणेश भगवंतांना शरण जातो. जिथे जिथे श्री गणेशाची पूजा केली जाते तिथे विघ्नासूर जवळ येत नाही असे पुराण ग्रंथातून अनेक उल्लेख आढळतात. यामुळेच आजच्या काळात सुद्धा मानवी जीवन जगत असताना अनेक संकट येतात यावेळी अनेक भाविक श्री विघ्नेश्वराची अर्चना करताना दिसतात. चांगले आरोग्य, दीर्घायुष्य आरोग्य मिळण्यासाठी,समाजामध्ये चांगले मानसन्मान मिळण्यासाठी, सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी, मानसिक सुख समाधान प्राप्त होण्यासाठी, घराचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी, घरांमधील सुख-शांती समाधान टिकून राहण्यासाठी, सौभाग्य प्राप्त करण्यासाठी, संततीच्या सुख-समृद्धीसाठी, सर्व प्रकारच्या वाईट -अशुभ गोष्टी, पापातून मुक्त होण्यासाठी, सर्व प्रकारच्या अनाआरोग्याचा त्रास कमी होण्यासाठी, रोगाची तीव्रता कमी होऊन लवकर आराम मिळण्यासाठी, सर्व प्रकारच्या उद्भवलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी, संकटातून मुक्त होण्यासाठी, शिक्षणामधील अडचणी दूर होऊन चांगले यश मिळवण्यासाठी,व्यापार उद्योग यामध्ये चांगले यश मिळण्यासाठी, शत्रूशमन, शत्रू नष्ट होण्यासाठी,हाती घेतलेले काम पूर्ण होण्यासाठी, कल्याणा प्राप्तीसाठी, आर्थिक लाभ होऊन समृद्धी प्राप्तीसाठी ,पदोन्नतीसाठी, दुःख, कष्ट दूर होण्यासाठी अशी एक ना अनेक विघ्ने दूर होण्यासाठी अनेक भाविक श्री विघ्नेश्वराची आराधना करताना दिसतात. सर्व शक्तींची देवता म्हणजे अमोघ देवता म्हणून श्री गजाननास श्री विघ्नेश्वर म्हटले जाते. दक्षिण काशी क्षेत्री सर्व देव देवता यानुसार या क्षेत्राचे हे श्री लिंग तीर्थस्य विघ्नविनाशनं तीर्थ स्थान येथे पहावयास मिळते. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर कोल्हापूर येथील प्राचीन मंदीर म्हणजे श्री विघ्नेश्वर -सोमेश्वर -महादेव मंदिर.
श्री कपालेश्वर महादेव शिवपिंडी.
मंदिराशेजारील महादेव भक्त मंडळ फलक
श्री कपालेश्वर महादेव शिवपिंडी.

श्री कपालेश्वर महादेव मंदिर दरवाजा.
श्री कपालेश्वर महादेव मंदिर.
 महादेव मंदिर ,जासुस गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर.
 
श्री कपालेश्वर ;- भीती, डर,खौफ अशा वातावरणात सुद्धा ज्या मंदिराने आपले स्वत्व,स्वाभिमान जपले असे मंदिर म्हणजे मंगळवार पेठ, जासूद गल्ली,कोल्हापूर येथील श्री कपालेश्वर- महादेव मंदिर. कोल्हापूर मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू बँकेसमोरील छोटा बोळ म्हणजे ही जासूद गल्ली. या बोळातून पाच-सात घरे सोडताच लगेच छोटेखानी चौकात हे श्री महादेव मंदिर लागते. लागून लागून घरे, आर.सी.सी. भव्य इमारती यामध्ये हे मंदिर दडून गेले आहे.पण पूर्वीच्या काळचा विचार करता गावच्या वेशीवरचा मारुती याच्या पुढील भाग म्हणजे संपुर्ण मोकळा परिसर. शेतवट परिसरात किरकोळ लोकवस्ती यातच सध्याच्या मिरजकर तिकटी परिसरातच शहराची मजबूत दगडी तटबंदी, यामुळे या तटबंदी बाहेर शत्रुपक्षाच्या लष्कराच्या छावणीचा तळ असे. आक्रमणे आणि प्रतिआक्रमणे असा संघर्ष सातत्याने असायचा. यवन कालखंडात तर धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखणे ही सुद्धा एक तारेवरची कसरत बनले होते. यावेळी आपले सत्व,स्वाभिमान कसा जपणार हा एक यक्ष प्रश्नच बनला होता. कोल्हापूर वरील अंमलदार उस्मान हकीम शेख, मोहम्मद काजी ,बाबुल खान, शेख अबीब इमान, उल हसिम सुफा शेरा, मोहम्मद अबु उस्मान, गफूर खान, यासीन खान यांचे अनेक तत्कालीन कागद पहावयास मिळतात. यवन काळातील कोल्हापुरातील बरेचसे अंमलदार हे चांगले होते. पण सैन्यातील अधिकारी यांची दांड गाई यापासून प्रजाजनात सतत भितीयुक्त वातावरण असायचे. ज्या ज्या मंदिरात आता सध्या गोमुख तीर्थ आहे तेथे स्वधर्मा साठी अत्यंत पवित्र असणाऱ्या गाईंच्या कत्तली झाल्या आहेत.एक एक मंदिराप्रमाणे हे ही मंदिर मान टाकणार की काय? अशा वेळी मंदिराचे रक्षण कसे करणार? जीवन मूलाधार कसे सांभाळणार? हीच सर्वात मोठी समस्या होती. यामध्ये श्री कपालेश्वर -महादेव मंदीर तर मोकळ्या परिसरात ठळक उठून दिसावे असे हे मंदिर.बारा बाय बारा दगडी एकपाकी, साधारण उंची ही तेवढीच,एवढेच मंदिराचे स्वरुप. शहराच्या तटबंदीच्या बाहेर असणारे हे मंदिर शत्रु पक्षाच्या सैन्यसेनेस नजरेत भरायचे यावेळी प्राचीन महात्म्य जपण्यासाठी मंदिर जसेच्या तसे ठेवून मंदिराच्या शिखरावर शिखराऐवजी घुमट बनवून तसेच चारी बाजूला छोटे मिनार याची रचना करत घुमटाकृती मंदिर रचना केली. छोट्या तसेच लांब पल्ल्याच्या तोफा यांच्या नजरेत जरी हे मंदिर आले तरी आता घुमटाकृती रचनेमुळे गोलंदाज या क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत. काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतरं झाली. बदल बदलाव झाले. तरी मंदिर स्थानमहात्म्य जसेच्या तसे अबाधित राहिले आहे.सध्याच्या काळात शिखर रचनेत थोडाफार बदल करत पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला आहे.भारतीय संस्कृतीमध्ये साधना, उपासना, व्रत-वैकल्य,मंत्र पठण यांचे अपार महत्त्व आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी घरोघरी प्रिय असणारे प्रदोषव्रत अनेक जण करताना दिसतात. यामध्ये श्री कपालेश्वर शनी प्रदोष व्रत हे श्री महादेव भक्तांमध्ये अतिप्रिय आहे. अशा अनुषंगाने श्री कपालेश्वर महादेव प्रदोष व्रत पोथीही आढळून येते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या हेतूने प्रेरित होऊन हे प्रदोष व्रत केले जाते. सूर्याचा अस्तकाळ आणि रात्रीचा संधीकाळ याला प्रदोष काळ म्हटले जाते. या काळातील श्री महादेव पूजन हे पुण्य फलदायी मानले जाते. या प्रदोष व्रताचे व्रत प्रत्येक वारानुसार सांगितले आहे. रवी प्रदोष व्रत, सोम प्रदोष, मंगळ प्रदोष, बुध प्रदोष,गुरू प्रदोष,शुक्र प्रदोष, शनि प्रदोष व्रत असे विविध गुणात्मक ,फलदायी व्रत करताना अनेक जण दिसतात. असे हे प्रदोष व्रत दर महिन्याच्या त्रयोदशीला केले जाते. प्रत्येक महिन्याचे दोन भाग असतात.एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्णपक्ष. या प्रत्येक पक्षाच्या तेराव्या दिवसाला त्रयोदशी म्हणतात. त्यादिवशी हे व्रत करण्याची पद्धत आहे. श्री कपालेश्वर महादेव शनिप्रदोष, महाशिवरात्री या दिवशी विशेष पूजा महत्त्व आहे. प्राचीन ग्रंथातून श्री कपालेश्वर स्थान म्हणजे हत्या पातक क्षेत्र मानले आहे. करवीर क्षेत्राच्या जुन्या ग्रंथांमध्येही कपालेश्वर सनिध्यौ उत्तरस्या प्रातृंणा तीर्थ असे वर्णन आढळून येते. आज या तीर्थकुंड तळ्याची जागा दाट लोकवस्ती ने घेतलेली आहे.एकेकाळी शेतवटामध्ये दिसून येणारे मंदिर आज शोधावे लागते, असे असले तरीही अनेक शिवभक्त,जासूद गल्ली तसेच करवीरकर वासियांसाठी हे मंदिर आजही पूर्वीइतकेच श्रद्धास्थान आहे. कितीही संकटं आली तरी आपलं स्वत्व, स्वाभिमान जपणं याबरोबरच ते इतल्या मातीत रुजवण्याचं काम अनेक व्यक्ति, स्थान क्षेत्रापासून झालेले दिसते. यापैकीच एक म्हणजे हे प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले मंदिर श्री कपालेश्वर- महादेव मंदिर.


शिंगणापुर श्री महादेव मंदिरासमोरील श्री नंदी मूर्ती.
 
शिंगणापूर श्री नरसिंह मंदिरासमोरील श्री गजलक्ष्मी मूर्ती.
 
शिंगणापूर नरसिंह मंदिरासमोरील समाधी पादुका.
 
शिंगणापूर श्री नरसिंह मंदिर येथील श्री नरसिंह लक्ष्मी मूर्ती.   
 
शिंगणापूर येथील श्री नरसिंह मंदिर.
 
शिंगणापूर श्री क्षेत्र विशाळतीर्थ परिसर.  

शिंगणापूर येथील महादेव मंदिर.
श्री नरसिंह मंदिर शिंगणापूर येथील समाधी पादुका.
श्री शिंगणापूर येथील विशाळेश्वर महादेव शिवपिंडी.
 
श्री विशाळेश्वर ;- पितृदोषाच्या मुक्तीसाठी धर्मशास्त्रानुसार काही स्थानमहात्म्य प्रमाणबद्ध झाली आहेत यापैकीच एक म्हणजे हे श्री विशाळेश्वर- महादेव मंदिर. शिंगणापूर.,कोल्हापूर पासून जेमतेम चार ते पाच किलोमीटर अंतरावरील गाव. उत्तरेश्वर पेठ लक्षतीर्थ वसाहत मार्ग द्वारे शिंगणापूरास पोहोचता येते.याचबरोबर रंकाळा, चंबुखडी या मार्गेही शिंगणापूरास पोहोचता येते. शिंगणापूरातील नदी घाट किनारी हे विशाळेश्वर- महादेव मंदिर आहे. मंदिर एकदम छोटेखानी दहा बाय दहा, साधारण उंची ही सात एक फूट, या दगडी मंदिराला शिखर ही दगडी असे एकंदरीत मंदिराचे स्वरूप आहे. हे प्राचीन ग्रंथानुसार ब्रह्मदेवाचे स्थान आहे. पण मंदिरा मध्ये पिंडी स्थान असल्यामुळे तसेच समोर नंदी स्थान असल्यामुळे शिंगणापूरातील महादेव मंदिर म्हणूनच हे स्थान प्रसिद्ध आहे.शिवपिंडी खूप प्राचीन असून समोरील नंदी मूर्ती ही तितकीच सुंदर आहे. अगदी हुबेहूब या मंदिरा सारखेच आणखीन एक मंदिर या मंदिरा शेजारी आहे. हे नरसिंह मंदिर आहे.येथे नरसिंह लक्ष्मी मुर्ती, श्री गजान्तलक्ष्मी मूर्ती तर दगडी चौकोनात समाधी पादुका ही येथे पहावयास मिळतात.हा संपूर्ण परिसर विस्तीर्ण असून नैसर्गिक दगडी पाणवठा पठार लाभलेले आहे. याचबरोबर येथे होणारी पौष यात्रा लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायतीने नदी काठास सिमेंटचा लादी कोबा, पायऱ्या करून घाट परिसर प्रशस्त बनवला आहे. येथे विशाल काय वृक्ष असून त्यांची मुळे उघड्यावरच असून वर जितके झाड असते तितकेच ते जमिनीखाली असते अशी उघड्यावर पडलेली मुळे दर्शवणारी झाडेही येथे पाहावयास मिळतात. कोल्हापूरच्या पश्चिमेला पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणारे हे सदन खेडेगाव शिंगणापूर येथील पौष आमावस्येला भरणाऱ्या यात्रेच्या वेळी एक वेगळाच उत्साह असतो. यावेळी हनुमंतवाडी ,नागदेवाडी आणि शिंगणापूर येथील ग्रामस्थ दैवतांच्या पालख्या येऊन मनोमिलन, भेट असे धार्मिक विधी कर्म होतात .पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटच्या अमावस्येला पौष अमावस्या म्हटले जाते. हि पौष अमावस्या म्हणजे सर्व सिद्धी दायक, सफलता दायक,पितरांसाठी शांती देणारी मानली जाते. नदीमध्ये स्नान,दिव्यास जलाअर्पण करणे, जल अर्पण करणे ,स्नानसंध्या, अर्ध्य देणे ,लाल चंदन, पिंपळाचे पाने, तुळशीची पाने अर्पण करणे याला विशेष महत्त्व मानले जाते. याच बरोबर दिवे लावणे, आपल्या वाडवडिलांच्या नावे दान अर्पण करणे याला विशेष महत्त्व आहे श्राद्ध, तर्पण या बाबीही शुभ मानल्या जातात. शनि दोष, पितृदोष हे ही दूर होतात. ग्रहांचा हानीकारक प्रभाव दूर करण्यासाठी या दिवशी केलेली साधना महत्त्वपूर्ण ठरते.अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच या शिंगणापूर येथील पौष अमावस्येच्या यात्रेस विशाळी अमावस्या असेच म्हणतात. येथील स्थान महात्म्य वर्णन अनेक ग्रंथामध्ये दिसून येते. या विशाळेश्वर महादेव मंदिरा शेजारीच नदीपात्रात प्राचीन श्री हटकेश्वर मंदिर आहे. या श्री हटकेश्वर मंदिराचे ही तितकेच स्थान महात्म्य आहे. पण हे मंदिर सतत पाण्याखाली, पाण्यात असल्यामुळे अलीकडील काळातील व्यक्तींना येथे जागृत मंदिर आहे हे ध्यानातच येत नाही. श्री हटकेश्वर मंदिराच्या वर पाच फूटाहून अधिक नदीची पाणीपातळी असते. पावसाळ्यात तर ही पाणी पातळी अधिक पटीने वाढते. "करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता "या प्राचीन ग्रंथामध्ये श्री विशाळतीर्थाबद्दल '"पूर्वोक्त विशाल तीर्थ भोगावती गंगाश्रृत वर हटकेश्वरलिंग हट केशासुरव भणि विशाला स्कर दे हे ब्रह्मा." असे वर्णन दिसून येते.तर करवीर यात्रानुक्रम यानुसार" र्व नू विशाल तीर्थ भागतःतत्तीर्थ वृश्चिकस्थदेवगुरौ मुंडनादितिर्थाविधीतथा महादानादि भिःमहतुफले तत्र विशाल तीर्थ पातालखंगयायुतं हाट केशलिंगे तस्पुरवमागे ब्रह्मा आग्नये यां नारसिंध्हः याम्येकमलभेरवः" अशी वर्णन दिसून येते .करवीर महात्म्य या ग्रंथातील त्रेसष्टाव्या अध्याय तर विशाल तीर्थ महत्त्व असा एक अध्यायच आहे.देवर्षी च्याअनुज्ञे प्रमाणे शृगंण- सिंघण या राजाने आपले राज्य राजपुत्र श्रीधर आणि प्रधान चंद्रदत्त यांच्या स्वाधीन करून अनेक तिर्थांची यात्रा करत करत तो करवीरनगरीत पोहोचला. या ठिकाणी त्याने श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तीर्थ स्नान केले. अनेक तीर्थाची यात्रा करत करत विशाल तीर्थामध्ये स्नान करतात त्याच्या डोक्यावर,डोक्यामध्ये उत्पन्न झालेले शिंग गळुन पडले.यास्तव तेथील सर्व तीर्थांचा आणि मंदिरांचा जीर्णोद्धार केला.या राजा मुळेच या गावास शिंगणापूर असे नाव पडले आहे. या विशाल तीर्थस्थानी अनेक महनीय व्यक्ती ,ऋषी-मुनी ,साधु संत यांनी येथे येऊन स्नान स्नानादि विधी कर्म केली आहेत. अगस्ती आणि लोपामुद्रा यांनीही या क्षेत्राची यात्रा केल्याचे संदर्भ आढळून येतात. आनंद, मांगल्य, प्रेम, चैतन्य म्हणजे यात्रा. आजच्या धकाधकीच्या जीवनात ही खेडेगावपणाचा ऐटबाजपणा, निवांतपणा, मानसिक उंचीचे ठिकाण, संवादाचे प्रभावी माध्यम हे जर कोठे पहावयास मिळत असेल तर ते स्थानमहात्म्य म्हणजे हे शिंगणापूर येथील श्री विशाळेश्वर- महादेव मंदिर.
 
श्रीक्षेत्र प्रयाग चिखली कोल्हापूर येथील पंचगंगा संगम घाट
श्रीक्षेत्र प्रयाग येथील पंचगंगा संगम घाटा शेजारी दिसणारे श्री बिंदुमाधवेश्वर मंदिर.
कोल्हापूरहून वरणगे गावी जात असताना श्री क्षेत्र प्रयाग येथील घाट परिसर तसेच या घाट परिसरात शेजारी असणारा पूल.
श्री बिंदुमाधवेश्वर मंदिर.
श्री बिंदुमाधवेश्वर
श्रीक्षेत्र प्रयाग येथील घाटा शेजारी असणारे श्री बिंदुमाधवेश्वर मंदिर.
 
श्री बिंदुमाधवेश्वर ;- श्रीक्षेत्र प्रयाग येतील कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी ,(सरस्वती) या नद्यांच्या संगम स्थानापासून प्रवाहित होणारी नदी म्हणजे पंचगंगा नदी. या संगम स्थानावर असणारे, धार्मिकते बरोबर विज्ञानाची जोड दिलेले प्राचीन स्थान महात्म्य मंदिर म्हणजे श्री बिंदुमाधवेश्वर मंदिर. प्राचीन ग्रंथ कथेनुसार भगवान महाविष्णू मन्दराचल पर्वताहून श्रीक्षेत्र काशी येथे आले. हे प्रसन्न संगमस्थान पाहून श्री भगवान संतुष्ट झाले.यावेळी या तीर्थ स्थानावर ऋषी अग्नीबिंदू राहत होते.भगवंतांना प्रत्यक्ष आपल्या येथे पाहिल्याचे पाहून ऋषी अग्नी बिंदू भगवंत स्तुती करू लागले. अग्नीबिंदूंची भक्ती पाहून भगवान महाविष्णू प्रसन्न झाले व म्हणाले," तुम्ही कोणताही वर मागा."यावर विनम्रतेने ऋषी अग्नीबिंदु म्हणाले ,"भगवंत तुमचा नेहमी येथे वास राहावा." भगवंताच्या आशीर्वादाने पावन झालेले स्थान महात्म्य म्हणजे हे बिंदू माधव मंदिर होय. ऋषी अग्नीबिंदू मधील बिंदू आणि भगवंताचे एक नाव माधव असे मिळून या मंदिराचे नाव बिंदूमाधव असे पडले आहे. मंदिर एकदम छोटे जेमतेम सात बाय सात फूट, उंचीही तेवढीच. त्यातही निम्मे मंदिर नदीपात्रात तर निम्मे मंदिर बाहेर अशी अवस्था असते. दोन बाय चार अशी मंदिराची दगडी चौकट यातून बहुतांशवेळा निम्म्याहून अधिक मंदिराचा भाग नदीकाठचा चिखलगाळ मंदिरात पहावयास मिळतो. खराब नारळ, कपडे, भग्न देवदेवतांची चित्रे, मूर्ती, प्लॅस्टिक वस्तू, पिशव्या अशा दुर्गंधीयुक्त परिसरामुळे पवित्र घाट परिसरास अपवित्रतेची किनार दिसून येते. घाट परिसर मात्र विस्तीर्ण आहे.येथे सिमेंटचा जाड लादी कोबा करून,तसेच दगडी फरशी बसवून ग्रामपंचायतीने चांगली व्यवस्था केली आहे. श्री बिंदुमाधवेश्वर याचप्रमाणे प्राचीन स्थानमहात्म्य असणारे अगदी याच मंदिराप्रमाणे श्री वेणू माधव मंदिरही येथे आहे. पण ते नेहमी नदीपात्रात पाण्यात असते. अगदी क्वचित प्रसंगी हे मंदिर पहावयास मिळते. कोल्हापूर शहराची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी ची सुरुवात जिथून होते असे स्थान म्हणजे हे प्रयाग क्षेत्र असून प्राचीन सभ्यता, विज्ञान-तंत्रज्ञान यांचे हे एक दर्शन शास्त्र आहे.कोल्हापूर शहर आणि त्याच्या निम्म्याहून अधिक भागात पंचगंगा नदी ची किनार याच बरोबर शहरात तीस पेक्षाही अधिक तळी, जलस्त्रोत हजारो दशलक्ष घन लिटर पाणीसाठा यामुळे कधीही पाण्यापासून हे शहर वंचित राहणार नाही. पाणी म्हणजे जीवन म्हणत असताना दुष्काळ आला तरी पाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण अशी ही रचना त्या काळी पाहायला मिळते, की जेणेकरून पाण्याचा एक थेंबही वाया घातला जाऊ दिला जाणार नाही. याचबरोबर नदी, तळी यातूनच शेतीसाठी हे पाणी वापरले जात होते. याशिवाय ही तळी एकमेकांना जोडली गेली होती यामुळे पाणी पातळी कायम स्थिर. ओव्हरफ्लो, पाणी पातळी मध्ये वाढलेली फुग असे प्रकार होणार नाहीत. नैसर्गिक पानवटे याचीही काळजी घेतली होती. नैसर्गिक पाणवटे बंद केल्यामुळे रंकाळा तळे शहरी भागाकडे प्रवाहित करणारे पाणी याचा अनुभवही कोल्हापूरकरांनी घेतला, पण त्यावेळच्या काळात पक्या भाजीव विटांची उंच घरे शिवाय पाण्याचा निचरा होणारे भूमिकेत मार्ग हे राहणीमानाचं वैशिष्ट्य दर्शवणारं प्राचीन शहर आज ब्रह्मपुरी टेकडी खाली गाडलं गेलं आहे. ज्यावेळी संपूर्ण जगास कसलेही ज्ञान नव्हते त्या काळी येथील लोकांना,वास्तुशास्त्र,पाणी नियोजन याचे उत्तम ज्ञान होते. ज्या ग्रेट पिरॅमिडसना आर्किटेक्चर वंडर म्हटले जाते पण त्याच्याही आधी प्रगल्भ नागरीकरण वास्तुरचना विकसित होती. येत्या काळात पिण्याचे पाणी ही एक जागतिक समस्या होणार आहे. अशा वेळी एक हजार वर्षांचा विचार करून पाण्यासाठी स्वयंपूर्ण अशी रचना प्राचीन काळी बनवली होती. शहराच्या दोन्ही बाजूस नैसर्गिक पंचगंगा नदी शिवाय त्याकाळी दगडांना तासकाम, आकार देत बंदिस्त तळी बनवत कल्पकता, तंत्रज्ञान याचा वापर त्याकाळी केला होता. जलव्यवस्थापन, गणित, वास्तुरचना, रस्ते, व्यापार,प्राकृतिक संरक्षण याबाबी विश्वामधील सर्वात प्राचीन शहर करवीर कोल्हापूर येथे दिसून येतात. प्राचीन शहर मोठ्या महाकाय भुकंपामुळे जमिनीखाली गाडले गेले असले तरी शहरासाठी जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी, तसेच अनेक तळी,तलाव स्थानमहात्म्य स्थळे आजही पहावयास मिळतात .यातीलच प्रमुख म्हणजे नद्यांचा संगम होणारे प्रयाग-पंचगंगा स्थान येथील श्री बिंदू माधव मंदिर. यामुळेच येथील धार्मिक स्थान महात्म्य पहाता स्नान, दान यांना विशेष महत्त्व आहे.श्री बिंदुमाधव दर्शन मात्रे अनेक कष्ट दूर होतात आणि तिन्ही लोकांचे सुखप्राप्ती होते अशीही भाविकांची श्रद्धा आहे. असे हे धार्मिकतेबरोबर विज्ञानाची जोड दिलेले दक्षिणकाशी, करवीर, कोल्हापूर श्री क्षेत्र प्रयाग पंचगंगा संगम स्थान येथील श्री बिंदुमाधवेश्वर- महादेव मंदिर.
श्री वालखिल्येश्वर मंदिरास मुख्य रस्त्यावरून जोडणाऱ्या दगडी पायऱ्या मार्ग.
श्रीक्षेत्र प्रयाग येथील त्रिवेणी घाट परिसर.
श्री गणेश वाल्यखिलेश्वर महादेव मंदिर.
श्री वालखिल्येश्वर मंदिर येथील श्री गणेश मूर्ती.
श्री वालखिल्येश्वर मंदिरात असणार्या श्री विठ्ठल-रुक्मिणी, गणेश मुर्ती.

श्री वालखिल्येश्वर मंदिर येथील मंदिरासमोरील श्री नंदी मूर्ती.
श्री वालखिल्येश्वर मंदीर पाठीमागील बाजू.
श्री वालखिल्येश्वर शिवपिंडी
 
श्री वालखिल्येश्वर- महादेव मंदिर .;- सर्वात जुन्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे कोल्हापूर. कोल्हापूरची जीवनदायीनी असणाऱ्या पंचगंगा नदी उगम -संगमस्थान क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र प्रयाग स्थान. या प्रयाग स्थान त्रिवेणी संगम स्थानावरील श्री गणेश मंदिर म्हणजे हे श्री वालखिल्येश्वर महादेव मंदिर. विशाळगडावरून येणारी कासारी नदी आणि कसबा बीड मध्ये कुंभी आणि तुळशी या दोन नद्यांचा संगम होऊन येणारी भोगावती नदी अशा या दोन नद्यांच्या संगम याचबरोबर गुप्त नदी सरस्वती अशा या नद्यांचे त्रिवेणी संगम स्थान म्हणजे श्री क्षेत्र प्रयाग. येथील श्री वालखिल्येश्वर महात्म्य अनेक ग्रंथात दिसून येते या नद्यांच्या संगम स्थानावर नदीपात्रात दहा बाय दहा, उंचीही जेमतेम तेवढीच, दगडी एक पाकी श्री वालखिल्येश्वर-महादेव मंदिर आहे. हे मंदिर सतत नदीपात्रात म्हणजे या मंदीराच्या वर बाराही महिने तीन ते चार फूट पाणी पातळी असते पावसाळ्यात तर ही पाणीपातळी दहा-एक फुटांपेक्षा अधिक असते. हे नदीपात्रातील तीर्थ गुप्त स्थान असून या त्रिवेणी संगम घाटा शेजारी मूळस्थान गुप्त नदीपात्रात असल्यामुळे दर्शनमात्रे हे स्थानस्वरूप महात्म्य म्हणून हे श्री वालखिल्येश्वर मंदिर दिसून येते. प्राचीन मंदिर जेमतेम बारा बाय बारा दगडी एक पाकी, उंची ही तेवढीच या शिवपिंडीच्या पाठीमागे श्री गणेश मूर्ती शेंदूर ,ऑइल पेंट ने रंगवलेली दिसून येते. यामुळे या मंदिराची ओळख श्री गणेश मंदिर अशीच बनली आहे. नंतरच्या काळात मंदिरातील एका कोपर्यात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दगडी मूर्ती प्रस्थापित केल्या आहेत. या मंदिरा सभोवती तसेच समोर वीस बाय वीस आर.सी.सी. मंडप उभा करून मंडप आवारात फरशी बसवून मंदिर परिसर खुलाच पण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य रस्त्यापासून शंभर फूट आत मंदिर असले तरी मुख्य रस्त्यापासून दगडी पायऱ्याद्वारे सरळ या मडंपापर्यंत पोहोचता येते. या मंदिरा शेजारी श्री सद्गुरू रामचंद्र महाराज यांचे समाधी स्थान , मठ ही दिसून येतो. आर.सी.सी. दोन मजली मठ म्हणजे धार्मिक, अध्यात्मिक केंद्र असले तरी येथे नीरव शांतता असते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने कच्च्या रस्त्याद्वारे दुचाकी, चारचाकी वाहनाने नदीच्या पुलाखालून या संगम घाटावर स्नान, संध्येसाठी जाता येते. स्थानिक गावकऱ्यांसाठी ही एक स्मशानभूमी आहे. पण खरे पाहता हे दक्षिण काशी क्षेत्रातील श्री पिंण्डतारक क्षेत्र आहे. इथे अनेक वर्षे श्री ब्रह्मदेवांनी पिंडयज्ञ केल्यामुळे या क्षेत्री स्नान ,दान, पिंडदान महत्व प्राप्त झाले आहे. सुदिर्घकाळ पूर्व क्रतुकी सन्ताति यांनी विश्वकल्याणार्थ सुर्याप्रमाणे तेजस्वी साठ हजार उध्व्ररित्या ऋषींना जन्म दिला. द्वापारयुगात धर्मस्वरूप नारायण व्यास असतील, त्यावेळी पर्वत श्रेष्ठ गंधमादन वालखिल्याश्रमत महामुनी बली नावाने मी उत्पन्न होईन. तिथे माझे सुधामा, काश्यप, वशिष्ठ,विरजा असे चार पुत्र होतील. असे वर्णन शिवपुराणातील तिसऱ्या भागातील शतरूद्र संहितेमध्ये आले आहे. वाल्यखिल्य अग्नीपुराणांमध्ये सृष्टी, अभिवृद्धीसाठी श्री ब्रह्माजींचे हे साठ हजार मुले या अर्थाने वालखिल्ल्यांची उत्पत्ती दर्शवली आहे.नारद पुराण, ब्रम्हांडपुराण,ब्रम्हांड कथासरिता ,शिवपुराण, ब्रह्म पुराण, भागवत पुराण, महाभारत अनुशासन, लक्ष्मीनारायण संहिता,, वाली गरुड पुराण ,वायु पुराण, स्कंद पुराण ,वाल्मीकि रामायण, वालुवाहिनी ,स्कंदपुराण ब्रह्मवैवर्त पुराण, विष्णू धर्मोत्तर,वासुकी महात्म्य अशा अनेक पुराण ग्रंथातून श्री वालखिल्येश्वर उल्लेख महात्म्य वर्णन दिसून येते. वारंवार होणाऱ्या भौगोलिक बदलातून प्राचीन संस्कृती सभ्यता केंद्र म्हणजे प्रयाग क्षेत्र पण मोठ्या झालेल्या भूकंपातून प्राचीन कोल्हापूर शहर पूर्णतः जमिनीखाली गाडले गेले. प्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञान गणित, भूगोल यांच्याकडे आधुनिकतेने पाहण्याचा त्याकाळचा दृष्टिकोन, या नद्याचां एखाद्या समुद्री मार्गाप्रमाणे वापर करत संपूर्ण जगाशी,इटली, रोमशी व्यापार हे सर्व इसवी सन पूर्व पाच हजार वर्षांपूर्वी प्रगत वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शवणारे आहे. इंग्रज अथवा युरोप येथून प्रगत तंत्रज्ञान भारतात आले असे म्हणणाऱ्यांसाठी त्याकाळी भारत किती वैज्ञानिक तंत्रज्ञानाने स्वयंपूर्ण होता. हे दर्शवण्यासाठी कोल्हापूर प्राचीन करवीर ब्रह्मपुरी टेकडी उत्खलन संदर्भ पुरेसे आहे. मोहनजोदडो, हडप्पा, हरियाणा येथील शाखीगडी, गुजराते येथील लोथक, दोडावीरा सिंधुसंस्कृती यांच्यापेक्षाही प्राचीन संस्कृती दर्शन घडवणार शहर म्हणजे करवीर कोल्हापूर. आज ही संस्कृती, संपदा जमिनीखाली गाडली गेली आहे. भारतीय पुरातत्व खात्याकडून ही हे काम थांबले आहे. कोल्हापूर शहरावर नवा प्रकाशझोत टाकण्यासाठी हे पुरेसे आहे. असे जरी असले तरी शहराला जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी मात्र आज ही प्रवाहित आहे. या नदीचे उगम स्थान उपेक्षित असले तरी या श्री क्षेत्र प्रयाग- त्रिवेणी संगम घाटावर ही जुनी प्राचीन मंदिरे आजही पहावयास मिळतात. यापैकीच एक म्हणजे हे श्री वालखिल्येश्वर- महादेव मंदिर.
 









श्री पुष्करेश्वर- कोटेश्वर महादेव शिव पिंडी.



श्री नारायणदास महाराज मंदिरातील श्री सद्गुरु नारायणदास महाराज मूर्ती.
श्री कोटेश्वर महादेव मंदिरातील श्री नंदी मूर्ती


 
 
श्री कोटेश्वर- पुष्करेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील पुष्कर तीर्थ यात्रा स्थान महात्म लाभलेले ठिकाण म्हणजे श्री कोटेश्वर- पुष्करेश्वर महादेव मंदिर. पौराणिक, प्राचीन दक्षिण काशी यात्रा क्रमानुसार नागा, अगस्ती लोपामुद्रा यात्रा वर्णनात श्री कोटेश्वर-पुष्करेश्वर वर्णन आढळून येते. अनेक धार्मिक ग्रंथात ही श्री कोटेश्वर संदर्भ दिसून येतात. स्कंदपुराण केदार खंडातील १४४ व्या अध्यायात श्री कोटेश्वर महादेवाचे वर्णन दिसून येते. जिथे पश्चिम दिशेला उत्तर्वाहिनी गंगाकिनारी श्री ब्रम्हदेवांचा आश्रम होता.तिथे ब्रम्हाजींनी अनेक वर्ष तप करून कोटी राक्षसांना मुक्ती देऊन सृष्टी रक्षण केले. ब्रह्महत्येपासून मुक्ती देणारे स्थान म्हणून श्री कोटेश्वर ओळखले जाते. याचबरोबर प्राचीन ग्रंथ करवीर महात्म्य, श्री दक्षिणकाशी कथासार ,श्री करवीर महात्म्य कथासार, करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता, करवीर तीर्थयात्रानुक्रम येथेही श्री कोटेश्वर- पुष्करेश्वर वर्णन आढळून येते. नागांनी कोटी तीर्थात स्नान, पिंडदान करून गया यात्रा पूर्ण केली. तर दक्षिण भारतात कोटीतीर्थयात्रा श्रेष्ठ आहे असे वर्णन दिसून येते.करवीर महात्म्य या ग्रंथातील अगस्ती लोपामुद्रा संवादामध्ये कोटीतीर्थाचे महात्म्य सांगण्यावरून लोपामुद्राने विनंती केल्यावरून अगस्ती सांगू लागले,त्रैलोक्यातील तीर्थ समुदाय या ठिकाणी आल्याचे ऐकून पुष्करेश्वर पुष्कर तीर्थासह येथे येऊन राहिले यावरून या तीर्थास पुष्करेश्वर-कोटीतिर्थ असे नाव पडले.यातील स्नान, दान, पूजनाने कोट्यावधी तीर्थातील स्नान पूजनाचे पुण्य मिळते. येथील पिंडदानाने पितरांना मुक्ती मिळते. भानू राजाने येथे स्नान, दान, तर्पण केल्याने एका क्षणात त्यांच्या पातकांचा नाश झाला तेव्हा अशा या कोटीतीर्था ची कथा सांगण्याबद्दल पुन्हा लोपामुद्रा यांनी विनंती केल्यावरून अगस्ती सांगू लागले की, हे पहिले पुष्कर तीर्थ असून नंतर त्यास कोटीतीर्थ म्हणू लागले .पूर्वी तेहतीस कोटी देव व सहाष्टक कोटी असूर यांची या ठिकाणी लढाई होऊन त्यात दैत्यांनी देवांना पराभूत केले. सर्व देव श्री महालक्ष्मीची प्रार्थना करू लागले. यावर गण , रंक भैरव, मह्रगल ,सिद्ध बटुक, काल वेताळ ,नवकोटी, कात्यायनी, योगिनी ,गण इत्यादींना बरोबर घेऊन श्री महालक्ष्मीने दैत्यांबरोबर युद्ध केले. तेव्हा दैत्यांचा पराभव होऊन दैत्य दाही दिशेला पळत सुटले. फक्त एक कोटी असुर देवीबरोबर लढत राहिले. आता आपण देवीच्या हातून वाचत नाही असे पाहून ते असुर देवीला म्हणाले," हे भगवती, आम्हाला जीवाची आशा नाही.रणांगणावर आलेल्या मृत्यूने स्वर्गाची द्वारे खुली होतात. तथापि आमची एकच इच्छा आहे की, तुझ्या हातून आम्हाला मृत्यू यावा म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल."हे ऐकून श्रीमहालक्ष्मी म्हणाली," तुमचे शौर्य पाहून मी संतुष्ट झाले.तरी इच्छित वर मागा." यावर ते असूर म्हणाले," आम्ही एक कोटी असुर असून या पुष्कर तीर्थावर आहोत. या ठिकाणी तू आमचा वध कर व हे कोटीतीर्थ म्हणून प्रसिद्धीस यावे. सर्व तीर्थात हे श्रेष्ठ ठरो, येथील पिंडदानाने पितरांना उत्तम गती मिळो. तथास्तु म्हणून श्री महालक्ष्मीने त्यांना मुक्ती दिली. तेव्हापासून हे पुष्करतीर्थ कोटीतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले.कोल्हापुरातील राजर्षी शाहू मिल, बागल चौक शेजारी आजही हे विस्तीर्ण तळे दिसून येते.शाहू मिल शेजारी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर अध्यात्मिक केंद्र तर सलग महानगरपालिकेचे दुकान गाळे यामुळे हा परिसर रस्त्यावरून तसा दिसून येत नाही. पण आतील बाजूस एका बाजूस जुने हनुमान मंदिर आता या ठिकाणी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज मंदिर अध्यात्मिक केंद्र उभा राहिले आहे. मंदिर कसे असावे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या कोटीतीर्थ तळ्याच्या एका बाजूला हे श्री स्वामी समर्थ मंदीर तर बरोबर दुसऱ्या बाजूला हे प्राचीन श्री कोटेश्वर महादेव मंदीर आहे. पंधरा बाय पंधरा दगडी मंदिर तर शिखर ही दगडी दोनशे वर्षापूर्वीचे चे बांधकाम आहे. मंदिरासमोर पंचवीस बाय पंचवीस आर.सी.सी. एक पाकी मंडप उभा केला आहे. मंडपाबाहेर अतिसुंदर श्री नंदी मूर्ती आहे. येथे गिरीगोसावी घराण्यातील अनेक व्यक्तींच्या दगडी पादुका, शिवपिंडी, चौकोन शिल्प आढळून येतात. श्री नंदी मुर्तीपासून दोन तीन पायर्या घाट उतरताच हे पौराणिक पुष्करतीर्थ - कोटीतीर्थ लागते. सम्राट सिंघणदेव यादव कालीन विरगळही येथे दिसून येतात.छोटेखानीच पण अनेक विरगळ खूपच सुंदर आहेत. मोकळा परिसर तसेच तेवढेच मोठे निसर्गरम्य तळे यामुळे दिवसभर येथे अनेकजण गळ टाकून मासेमारीसाठी बसलेले असतात. निवांतपणा, विरुंगळा, अभ्यास केंद्र ,अध्यात्मिक उंची उभारी देणारे ठिकाण अशा अनेक बाबी इथे दिसून येतात. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला इथे अध्यात्मिक वारसा असणारे सद्गुरु नारायण दास महाराज होऊन गेले. सध्या श्री नारायणदास महाराज भक्त मंडळाच्या वतीने सर्व व्यवस्थापन पाहिले जाते. गिरीगोसावी घराण्यातील जटाधारी महाराज यांच्या समाधी ही येथे आहेत. कोल्हापुरास पूर्वी तळ्यांच कोल्हापूर म्हणून ओळखलं जात होतं.काळाच्या ओघात हि तीर्थकुंड, तलाव,तळी हळूहळू नष्ट होत चालली आहेत. पण वाढत्या नागरीकरणात सुद्धा पुष्कर तीर्थ- कोटीतीर्थ तळे ,श्री कोटेश्वर -पुष्करेश्वर मंदिर हे आज ही बदलत्या परिस्थितीत का होईना आबाधित आहे.श्री कोटेश्वर मंदिर- कोटीतीर्थ अनुषंगाने श्रीमंत छत्रपती शाहू कालीन जुनी कागदपत्रे ही आढळून येतात खरेतर हा वारसाच कोल्हापूरच्या वैभवाचे साक्षीदार आहेत. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री कोटेश्वर- पुष्करेश्वर महादेव मंदिर.
 
श्रीक्षेत्र प्रयाग येथील दत्तस्थान. श्री दत्त मूर्ती
श्री क्षेत्र प्रयाग येथील श्री प्रयागेश्वर मंदिरासमोरील श्री नंदी मूर्ती.
 
श्रीक्षेत्र प्रयाग येथील श्री दत्त मंदिर पाठीमागील बाजू
श्री क्षेत्र प्रयाग येथील श्री गोसावी स्वामी यांच्या पादुका समाधी 

 श्रीक्षेत्र प्रयाग येथील श्री गिरी गोसावी स्वामी यांची समाधी
 
जुन्या पंचांगातील श्री संक्रांति देवी चे चित्र
श्री क्षेत्र प्रयाग येथील श्री दत्त मंदिरासमोरील श्री गिरी गोसावी यांच्या समाध्या. समाधी स्थाने.
श्री क्षेत्र प्रयाग येथील श्री नंदी मूर्ती
जुन्या पंचांगातील श्री संक्रांति देवीचे कंकणासुर राक्षस वधाचे चित्र
श्रीक्षेत्र प्रयाग येथील गवाक्ष रचनेतील दगड.
श्री क्षेत्र प्रयाग येथील श्री प्रयागेश्वर मंदिरातील श्री कपाट स्वामी ची मूर्ती.
श्री प्रयागेश्वर- संगमेश्वर
जुन्या पंचांगातील श्री संक्रांति देवी चे चित्र
श्रीक्षेत्र प्रयाग येथील श्री दत्त मंदिर.
शंभर वर्षापूर्वीचे संक्रांति देवी चे चित्र
श्री प्रयागेश्वर- संगमेश्वर
 
 श्री प्रयागेश्वर ;- मकर संक्रांतीचा सण झाला की वेध लागतात ते प्रयाग स्नानाचे.प्रयाग स्नानतीर्थावरील हे प्राचीन मंदिर म्हणजे श्री प्रयागेश्वर- संगमेश्वर -महादेव मंदिर. मकर संक्रांतीचा सण हा स्नेह संवर्धनाचा सण मानला जातो.मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजे उत्तरायणारंभापासून मोठे घातलेले दिनमान जाणून लागते. पूर्वी इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्यावेळी माणसे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कामे करायची.दिनमान वाढत जाणार म्हणजे अधिकाधिक वेळ दिवसाचा मिळणार, अधिकारी काम करण्याची संधी मिळणार म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जात होता. किंकरासुर राक्षसाच्या वधाने ही दुष्ट प्रवृत्तींवर मिळवलेला विजयोत्सव ही या सणात समाविष्ट आहे. सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अंशावरून लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण करीत असतो त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. तर पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो यालाच उत्तरायण म्हणतात. पंचांग शास्त्रांमध्ये याचे खूप सविस्तर वर्णन मिळते. संक्रांत ही एक देवता मानली आहे. तिचे वाहन हत्ती, गाढव, डुक्कर असे दिसून येते. आमच्या घरातील दप्तरखाण्यामध्ये इसवीसन सतराशे सालापासून प्रत्येक वर्षाची हस्तलिखित दुर्मिळ पंचांग आहेत. यामध्ये संक्रांति देवी ची अनेक सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत. यामध्ये संक्रांत वर्णन दिसून येते. यामध्ये प्रयाग स्नान यास विशेष महत्त्व आहे. आपल्याकडे एक हिंदी गाणेही प्रसिद्धआहे. पाप करे और गंगा नहाये 'टेक इट इझी पोलिसी'.अर्थात हि एक बघण्याची दृष्टी आहे.,खरे पाहता वाईट विचार धुवून जावेत, सत्कर्माची वृत्ती वाढावी ,या निसर्गाचे आपण एक प्रकारे देणे लागतो.दानवृत्ती वाढावी, अध्यात्मिक उभारी मिळावी हा या गंगास्नान यामागे हेतू असतो. दान वृत्तीतून अनेक महिला हळदीकुंकवाच्या रूपाने दान वाटून सौभाग्य वाढावे यासाठी अभिवृद्धी दर्शवतात. संक्रांतीचा काळ हा थंडीचा काळ असतो यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात तर स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री या नात्याने गुळाचे मिश्रण करतात. याचबरोबर बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा शक्तिवर्धक पदार्थांचा जेवणात वापर करतात. हा आनंदाचा सण संक्रांतीपासून सर्व साधारण पंधरा दिवस पुढे साजरा केला जातो. या पंधरा दिवसात गंगा स्नानाचे महत्त्व ओळखून असंख्य भाविक या संगमस्थानास भेटी देतात. कोल्हापूर पासून पश्चिमेस तीन ते पाच किलोमीटर अंतरावर भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी, सरस्वती या पाच नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणास प्रयाग तीर्थ असे म्हटले जाते. कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून धार्मिक ,अध्यात्मिक महत्त्व फार आहे. काही स्थानांना भेटी देऊन ऊर्जा प्राप्त करावी अशी ही स्थाने आहेत. यातील प्रीतिसंगम स्थान म्हणजे प्रयाग.दोन मनांचं ,दोन जीवांचे मिलन, एकरूप होणे ही दृष्टी येथे असते. सुरुवातीला दोन्ही नद्यांचे पाणी पटकन एकमेकांत मिसळत नाही. दोन्हींचे वेगळेपण पटकन जाणवते पण नंतर मात्र ह्या मिलनाचे प्रीती संगमात रूपांतर होते अशा नद्यांचे एकत्रीकरण स्थान महात्म्य म्हणजे हे प्रयाग क्षेत्र आहे.प्राचीन काळी अशा या क्षेत्राच्या वायव्य दिशेला अर्ध्या कोसावर शुक्रमुनींचा आश्रम होता.या स्थानी स्वयंभव मनूने ही तपसाधना करुन ज्ञान प्राप्ती करून घेतली होती. ऋषशृंग ऋषी तसेच अनेक ऋषींचे आश्रम हीच या परिसरात होते. अगस्ती आणि लोपामुद्रा यांनीही या क्षेत्री येऊन स्नानविधि श्री प्रयागेश्वर दर्शन घेतले आहे. या क्षेत्री बाराव्या शतकामध्ये भव्य दगडी मंदिर होते.पुढे यवनकाळात ही मंदिरे पूर्णतः नेस्तनाबूत झाल्यामुळे जुन्या मंदिरांचे दगडी अवशेष इथे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. येथे बाधंकाम रचनेतील भव्ग गवाक्ष रचनेतील सहा बाय तीन अशी दगडी शिळाही पहावयास मिळते.गिरीगोसावी संप्रदायातील अनेक नाथपंथीय व्यक्तींच्या दगडी बांधीव समाधी येथे पहावयास मिळतात. दगडी स्मृती शिल्प ही अनेक आहेत.यांची संख्या सुमारे पन्नासहून अधिक आहे. प्राचीन स्वयंभू पादुका याठिकाणी आता दत्तमंदिर प्रस्थापित झाले असून या मंदिरासमोर ही गिरी गोसावी यांच्या समाध्या आहेत. या जुन्या प्राचीन मंदिराच्या ठिकाणी नव्याने आर.सी.सी. श्री दत्त मंदिर उभारण्यात आले आहे. आज दत्त मंदिर म्हणजे प्रयागस्थान ही ओळख बनली आहे. पण इथे या गिरीगोसावी समाधी परिसरात बारा बाय बारा दगडी एक पाकी,उंचीही जेमतेम तेवढीच असे पांढर्या चुन्याने रंगवलेले एक मंदिर आहे. हे या प्रयाग स्थानाचे मूळ श्री प्रयागेश्वर- संगमेश्वर -महादेव मंदिर आहे.या मंदिरातच दगडी दोन फूट उंचीची अतिशय सुंदर कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. बोलीभाषेत नावाची काय दशा होते ते इथे दिसून येते. चवणॠषी चे चव्हाटा तर कार्तिक स्वामींचे कपाट स्वामी असे शब्द रूढ झाले आहेत. श्री प्रयागेश्वर मंदिराबाहेर असणारी नंदी मूर्तीही खूप सुंदर आहे. येथील भव्य वृक्ष आणि मोकळा परिसर यात खुलून येणारे दगडी पार नैसर्गिक संवादाची वीण घट्ट करतात.मकर संक्रांति पासून पुढे सर्व साधारण एक महिना असणारा हा यात्रा काळ म्हणजे जनसंवादातून संवादाकडे आणि संवादातून आत्मसंवादाकडे असा हा मनाला उभारी देणारा प्रवास म्हणजे हे प्रयागस्नानपर्व. असे हे दक्षिणकाशी क्षेत्र करवीर येथील श्री प्रयागेश्वर- संगमेश्वर- महादेव मंदिर.
श्री पद्मावती मंदिर परिसरात असणारे दगडी कोरीव खांब.
श्री पद्मावती मंदिर.
श्री पद्मावती मंदिर परिसरात असणारा बागड खांब.
श्री पद्मावती मंदिर परिसरातील नाईकबा, नागराज ,हनुमान मूर्ती
श्री प्रल्हादेश्वर शिवपिंडी
श्री प्रसादेश्वर मंदिरासमोरील श्री नंदी मूर्ती.
श्री पद्मावती मंदिरातून दिसणारे श्री राधा कृष्ण मंदिर शिखर.
श्री पद्मावती मंदिर परिसरात असणाऱ्या मूर्ती अनुक्रमे श्री गजेंद्र लक्ष्मी ,सटवाई, अगस्ती लोपामुद्रा मूर्ती
श्री गणेश तसेच नागराज मूर्ती
श्री पद्मावती उद्यानामध्ये असणारे हत्ती चे समाधी मंदिर.
श्री प्रल्हादेश्वर शिवपिंडी पाठीमागे असणारा पाच फण्यांचे नाग शिल्प तसेच विरगळ
भुजंगराव पर्वतराव यादव यांच्या समाधी पादुका
श्री पद्मावती देवी मूर्ती.
 
श्री प्रल्हादेश्वर ;- नकारात्मकतेतुन सकारात्मकता, वाईटातून चांगलं ही निर्माण होऊ शकतं. कमलपुष्प सुद्धा दलदल अशा परिस्थितीत असते.पण चांगल्या बाबींचा ध्यास असला तर त्या बाबी प्रत्यक्षात उतरू शकतात. ही दृष्टी दर्शवणारे प्राचीन स्थानमहात्म्य म्हणजे श्री प्रल्हादेश्वर -महादेव मंदिर. कोल्हापुरातील मंगळवार पेठेच्या शेवटी फिल्म इतिहासातील सुवर्णपान म्हणजे जयप्रभा स्टुडिओ लागतो. येथील पद्मावती चे मंदिर म्हणजे पौराणिक इतिहासाचे साक्षीदार आहे.या पद्मावती मंदिरातच हे श्री प्रल्हादेश्वर मंदिर आहे. पूर्वीच्या काळी हा गावाबाहेरील जंगलाचा एक भाग, निसर्गरम्य तळे. पद्म म्हणजे कमळ. पद्मालय- पद्मतीर्थ- पद्माळे अशी नावे जुन्या ग्रंथात आढळून येतात. पद्मतीर्थाचे अध्यात्मिक महत्त्व अनेकांनी अधोरेखित केले आहे. गणेश पुराणात पद्मालय याचा उल्लेख येतो. पद्मपुराणात ही तीर्थक्षेत्र यात्रा का करावी, तसेच अनेक तीर्थक्षेत्र महिमा-पुण्यफल वर्णन दिसून येते. यानुसार दक्षिण काशी क्षेत्र करवीर दक्षिण मानस यात्रा यामध्येही श्री प्रल्हादेश्वराचा उल्लेख येतो.अगस्ती लोपा मुद्रा यांच्या तीर्थक्रमयात्रेमध्येही याचा उल्लेख आहे. करवीर महात्म्य या प्राचीन ग्रंथातील चौसष्ठाव्या अध्यायात कामदेव मदनाने येथे हे राज्य केले पण तो शापाला घाबरून पळून गेल्यावर एका कल्पापर्यंत पद्मनाभ राजाने राज्य केले. तो अत्यंत प्रजादक्ष व न्यायी राजा होता. म्हणून या स्थानास पद्मालय हे नामाभिधान प्राप्त झाले. असे नारदमुनी- धर्मराज संवाद यामध्ये आढळून येते.हे स्थान दक्षिण काशी क्षेत्रातील विष्णू गया आहे.मल्लालयासुर राक्षस प्रल्हाद तीर्थस्थान बाबूजीमाल जवळ तसेच सध्याचे बलभीम बँक- अपना बँक शेजारी असले तरी विष्णूगया तत्र पद्मजादेवी असे उल्लेख जुन्या ग्रंथात आढळून येतात. येथे भक्त प्रल्हादाने घोर तपस्या करून भगवान नरसिंहास प्रसन्न करून पितृद्रोहाचे पाप नष्ट केले. पापाचा नाश करणारे स्थान म्हणून हे श्री प्रल्हादेश्वर स्थानमहात्म्य आढळून येते.पद्मालय -पद्मतीर्थ तळयाच्या जागी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सुशोभित बगीच्या उभा केला असून या बागेला श्री पद्मावती उद्यान असेच नाव दिले आहे. या उद्यानांमध्ये श्रीमंत छत्रपती महाराज सरकार करवीर यांच्या संस्थानातील हत्तीची समाधी येथे आहे. येथे फक्त एक हत्तीचे शिल्प होते नंतर मंदिर परिसरातील प्राचीन दगड येथे आणून छोटेखानी गणेश, हत्तीचे एक मंदिरच उभा केले आहे.या मंदिरासमोर बिंनखांबी गणेश मंदिर परिसरातील भुजंगराव पर्वतराव यादव यांची समाधी -पादुका आहेत. श्री पद्मावती मंदिराशेजारी अठराशे सत्तावन च्या उठावाचे साक्षीदार असणारे श्री राधा कृष्ण मंदिर ही आहे.यादवकालीन प्राचीनतेची साक्ष सांगणारे श्री पद्मावती मंदिर हे नव्या- जुन्याचा संगम असणारे मंदिर आहे. यादवकालीन विरगळ, कोरीव खांब, दगड जसे मिळतील तसे विटा सिमेंट बांधकामात वापरून मंदिर सुशोभित करण्याचा प्रयत्न केला आहे. मूर्तींना शेंदुर, ऑइल पेंट लावून स्थानिकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हे जपण्याचा प्रयत्न केला आहे.श्री पद्मावती ची मूर्ती अडीच फुटाची असून दहा बाय दहा गाभारा तेवढीच उंची ही आहे. मंदिरास प्रदक्षिणा मारता येईल असा परिसर समोर आर. सी.सी. मंडप असे श्री पद्मावती चे मंदिर स्वरूप आहे. मंदिर परिसरात परिवार देवता म्हणून श्री विष्णू, नाईकबा ,नागराज, हनुमान, सटवाई, गजेंद्र लक्ष्मी, गणेश, अगस्ती लोपामुद्रा अशा दगडी मूर्ती आहेत.श्री पद्मावती चे मंदिर हे उत्तराभिमुख असून मंदिर मंडप आवारात दोन ते तीन फूट खोलगट भागात हे श्री प्रल्हादेश्वर मंदिर आहे.या लिंगा पाठीमागे पाच फण्यांचा नाग असे शिल्प आहे. अगदी चार बाय चार चे छोटेखानी मंदिर.पाठीमागील भिंतीत यादवकालीन विरगळ दिसून येते. श्री प्रल्हादेश्वर मंदिरासमोर श्री पद्मावती मंडप आवारातच श्री नंदी मूर्तीही दिसून येते. भक्त प्रल्हादास भक्ती प्रसंगी मह्दकाय प्रसंगांना सामोरे जावे लागले. कड्यावरून ढकलून देणे, अग्निपरीक्षा ,सर्पगृहात डांबून ठेवणे अशा नानाविध प्रसंगांमध्ये ही भगवंत नामस्मरण सोडले नाही. कितीही ठासून नकारात्मकता असली तरी त्याचे रूपांतर सकारात्मकते मध्ये करता येते याचे उदाहरण म्हणजे हे श्री प्रल्हादेश्वर स्थानमहात्म्य आहे. म्हणूनच पद्म-पद्मालय हे विष्णू स्थान राहिले आहे.पद्म म्हणजे कमळाचे फूल, एक भाग्य सुचत चिन्ह,विष्णूच्या एका आयुधांचेही नाव, गणितातील सोळाव्या स्थानातील संख्या, एका नक्षत्राचेही नाव,वास्तुविद्येतील स्तंभातील सातव्या भागाचे नाव. पद्म हे सौख्यपद देणारे मानले असल्याने श्री महालक्ष्मी देवीची स्तुती करतानाही पद्म वर्णन आले आहे. श्रीसुक्ता मधील फलश्रुती मध्ये पद्म- आनने- हे कमल नयने, पद्म- उरु- कमळाप्रमाणे मांड्या असलेल्या ,पद्म-अक्षी-कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, पद्म सम् भवे -कमळातून उद्भभवलेल्या ,हे कमलनयन तू माझ्यावर अशी कृपा करावी की ,जेणेकरून मी सौख्य पद प्राप्त करून घेईन .असे वर्णनही दिसून येते. ही स्थाने म्हणजे कोल्हापूरच्या इतिहासातील वैभवाच्या पाऊलखुणा आहेत. कलामहर्षी बाबुराव पेंटर,चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे जुने चित्रपट बारकाईने पाहिल्यावर संस्थानकालीन जुन्या कोल्हापूरचे दर्शन होते. बर्याच चित्रपटातून श्री पद्मावती प्रल्हादेश्वर मंदिर परिसराचे चित्रीकरण पहावयास मिळते. आजच्या दगदगीच्या काळामध्ये ही निवांतपणा अनुभवता येणारे, मानसिक उभारी देणारे असे हे श्री पद्मावती प्रल्हादेश्वर मंदीर आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री प्रल्हादेश्वर -महादेव मंदिर.
 
श्री चवण तीर्थ तलाव या ठिकाणी उभी असलेली शाळा ईमारत तसेच पटांगण
श्री चवण ऋषी शिळास्थान
श्री चवणेश्वर मंदिरातील वीरगळ
प्रयाग चिखली गाव चावडी शेजारी असणारे महाशिव म्हसोबा देवालय.
श्री चवणेश्वर
श्री चवणेश्वर महादेव मंदिर.
श्री चवणेश्वर तसेच नंदी मूर्ती
श्री चवणेश्वर महादेव मंदिराशेजारील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभारा ग्रंथ पुजा
 
श्री चवणेश्वर ;- मानवी जीवनासाठी नवी दृष्टी, प्रेरणा, संजीवक, अनंत कोटी उपयुक्त अशी काही स्थानमहात्म्य आहेत यापैकी दक्षिणकाशी क्षेत्र करवीर,प्रयाग चिखली येथील प्राचीन स्थान महात्म लाभलेले मंदिर म्हणजे श्री चवणेश्वर- महादेव मंदिर. भारतीय संस्कृतीचा गौरव ,अभिमान वाटावा,आजच्या काळात ही मानवी जीवनासाठी अतिशय उपयुक्त अशा बाबी प्राचीन परंपरेने दिलेल्या आहेत.आपल्याला एखादी महत्त्वाची गोष्ट हाती लागावी की, ज्याने आपले शरीर तंदुरुस्त बनेल, असा काय रामबाण असेल की जेणेकरून आपले स्वास्थ्य एकदम ठीकठाक राहील. असं खरोखरच असू शकेल? तर होय. याचे उत्तर होय असेच आहे. आपल्या आयुर्वेदाने प्राचीन काळापासून ही परंपरा जपत हा ठेवा आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. याचं नाव आहे चवणप्राश.प्राचीन काळापासून हे चालत आले आहे. यांचे मूळ निर्माते, श्रेय हे महाऋषी चवण यांना दिले जाते. चवण ऋषी वृद्धावस्थेत गेल्यानंतर त्यांना पुन्हा तरुण व्हावेसे वाटत होते.यामुळे त्यांनी लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले ,खरं पाहिलं तर चवणप्राश हे एक रसायन आहे. अनेक शारीरिक व्याधींवर गुणकारी रसायन की जेणेकरून तुमचं तरुणपण अबाधित राहण्यास मदत होईल. प्राचीन ऋषींची कठोर मेहनत साधना यांची ही दृष्टी आहे. अतिप्राचीन काळी शर्यती राजाची कन्या सुकन्या अतिशय सुंदर रूपवान कोणालाही मंत्रमुग्ध करेल अशी होती. याउलट ऋषी चवण अतिशय वृद्धावस्थेमुळे त्यांचे शरीर सुरतकलेले, पूर्ण गोळा होत आलेले,थकलेले असे होते. पण ते एक महान आयुर्वेदाचार्य पण होते. एकदा ऋषी चवण अरण्यात घोर तप ध्यानामध्ये मग्न होते. ध्यान साधने मध्ये पूर्ण विलीन झाल्यामुळे त्यांच्या शरीरावर मातीचे थर ,वाळूचे कण साचून मातीचा ढीग झाला होता. पक्षांचे घरटे ,उठबस हे सर्व पण इथे सुरु होते. एकदा राजा शर्यती आपल्या कन्येसह त्या अरण्यात भ्रमंतीसाठी आला.कन्या सुकन्या अरण्यातील वृक्षांचा आनंद घेत होती. वृक्ष पाहता-पाहता चवणऋषी मातीच्या जागेकडे सुकण्याचे लक्ष गेले.त्या मातीच्या ढिगा मधून दोन प्रकाश पुंज बाहेर पडताना तिने पाहिले. हे पाहून तिला खूप आश्चर्य वाटले. तिने तिथे असणारे दोन काटे उचलून जिथून प्रकाशपुंज बाहेर येतोय तिथे रुतवून तो प्रकाश रोखण्याचा प्रयत्न केला. एकदम तिच्या लक्षात आले की, तिथून रक्त बाहेर येऊ लागले आहे यामुळे ती भयग्रस्त झाली. तिचे वडील पण हे सर्व तिथे उभा राहून हे पहात होते. एवढ्यात खरर्कन मोठा आवाज होऊन ऋषी चवण उभे राहिले. ते अतिशय क्रोधात होते. त्यांनी बघितले समोर राजा आणि त्यांची कन्या उभे आहेत. ऋषि चवण यांच्या डोळ्यातून रक्त वाहत होते. क्रोधा मध्ये त्यांनी राजा आणि सैनिकांना शाप दिला की, तुमचे मलमूत्र थांबेल. हे ऐकून राजा क्षमायाचना करत त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत घातले.आणि म्हणाले की, कृपा करून आम्हाला माफ करा. हे सर्व अज्ञानातून झाले आहे. यावर चवण ऋषी म्हणाले, हे राजन मी तुला एकाच बाबींवर क्षमा करू शकतो. वृद्धावस्थेमुळे मला माझ्या देखभालीसाठी साथीची आवश्यकता आहे. तुला शापातून मुक्ती हवे असेल तर तुझ्या मुलीचा विवाह तू माझ्याशी कर.यावर राजाने विचार केला आणि सुकन्येच्या संमतीने या विवाहास राजाने परवानगी दिली. चार पट वयस्क असलेल्या चवण ऋषींचा विवाह सुकन्येशी झाला. चवण ऋषींना आता पुन्हा आपण पण तरुण व्हावे असे वाटत होते. यासाठी त्यांनी देव अश्विनकुमार यांची कठोर तपसाधना केली. तपश्चर्येमुळे अश्विनकुमार प्रसन्न होऊन चवण ऋषींना तारुण्य पद बहाल केले. काही जडीबुटी याद्वारे तरुण पद मिळवता येते.ऋषि चवण यांनी हि आयुर्विद्या आपल्या पुरती मर्यादित न ठेवता ती जनकल्याणासाठी वापरावयाचे ठरवले. ऋषी चवण यांनी त्या जडिबुटी आपल्या आश्रमात लावल्या. त्यातूनच आवळ्याचे झाड निर्माण झाले. गुणकारी आवळा तसेच अन्य औषधी वनस्पती यांच्या पासून तयार झालेले चवणप्राश जाणकारांच्या सल्ल्यानुसार घेतले तर मानवी जीवनासाठी ते एक संजीवनकारकच आहे.ऋषी चवण यांना भृगऋषींचे पुत्र तर शुक्राचार्य यांचे भाऊ मानले जाते. अशा या प्राचीन चवण ऋषींचे स्थान महात्म्य कोल्हापूरपासून पन्हाळागड रस्त्याला अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर प्रयाग चिखली या गावी आहे. गावचे हे ग्रामदैवत आहे. यामुळे येथे मोठी यात्रा, उत्सव ही होत असतो. ग्रामीण बोलीभाषेत चवण ऋषी या ऐवजी चव्हाटा असे नावही रूढ झाले आहे.गाव चावडीशेजारीच चवण ऋषींचे शिळा स्वरूपात स्थान समोर तलाव- चवणतीर्थ, यातील निम्मा तलाव तसाच ठेवून निम्म्या तलावाच्या ठिकाणी शाळेचे पटांगण, इमारत उभा केली आहे.चवण ऋषी शिळास्थान येथे आर.सी.सी. मंडप उभा केला आहे. या शेजारी दहा बाय दहा दगडी एकपाकी श्री चवणेश्वर मंदिर दिसून येते.येथे भिंतीत नाग, देवी मुर्ती तसेच वीरगळ ही दिसून येतात. येथील आणखीन एक वैशिष्ट्य हे की,या श्री चवणेश्वर महादेव मंदिराशेजारी श्री विठ्ठल मंदिर भव्य दगडी बांधीव पद्धतीचे आहे. येथे कीर्तन-प्रवचन हे ठरलेलेच असतं. विठ्ठल भक्त ,माळकरी व्यक्तींनी स्वतः दगड रचून बांधलेलं हे मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात चौथ-यावर येथे श्री विठ्ठलाची तसेच कोणत्याही देवाची मूर्ती नसून अनेक धार्मिक ग्रंथ- पोथ्या ठेवलेल्या आहेत.त्यांची पूजा करून येथे ज्ञानयज्ञ केला जातो. वैचारिक समृद्ध संपन्न गाव ही ओळख आणि त्याचे बीज या विठ्ठल मंदिरातील भक्तिरसात दिसून येते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी साठी इनाम असलेले गाव म्हणजे चिखली. प्रयाग तीर्थ क्षेत्र,वरणगे क्षेत्र या गावाशेजारी नदीकाठी असणारी स्थानमहात्म्य आहेत. पाटलांचे वाडे,गुर्हाळ घरे,ऊस शेती, ग्रामीण संस्कृतीचा बाज इथे ओलांडून वाहतो आहे पण ग्रामस्थांची मनोमन श्रद्धा आहे की, हे सर्व आहे हे श्री चव्हाटा- चवण ऋषी ,चवणेश्वरामुळे. असे हे आजच्या काळातही उपयुक्त, मानवी जीवन सुख- समृद्ध करणारी काही प्रेरक स्थानमहात्म्य पहावयास मिळतात. यापैकीच एक म्हणजे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर, प्रयाग चिखली येथील श्री चवणेश्वर -महादेव मंदिर.
 
श्री त्रिसंधेश्वर संध्याळे परिसरात असणाऱ्या हत्ती महालची जागी सध्या असणारे शिक्षण उपसंचालक कार्यालय.
अपार्टमेंट भरमध्यवस्तीमध्ये गुरफटलेले श्री त्रिसंधेश्वर मंदिर.
हत्तीमहाल च्या ठिकाणी असणारे शिक्षण उपसंचालक कार्यालय.
श्री त्रिसंधेश्वर मंदिर पुढील बाजु.

श्री त्रिसंधेश्वर.

श्री त्रिसंधेश्वर महादेव मंदिरातील श्री नंदी मूर्ती
 
श्री त्रिसंधेश्वर ;- दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले आणखीन एक महादेव मंदिर म्हणजे श्री त्रिसंधेश्वर महादेव मंदिर. "करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता " या प्राचीन ग्रंथातील संदर्भानुसार 'सलिंगसंध्यातीर्थ संध्याळे' असा उल्लेख आढळुन येतो. प्राचीन, ऐतिहासिक काळी कोट कोल्हापूर बुरूजांच्या बाहेर निसर्गरम्य वातावरणात संध्याळ तीर्थकुंडाच्या ठिकाणी असलेले प्राचीन शिवमंदिर म्हणजे हे श्री त्रिसंधेश्वर मंदिर. निसर्ग संपन्नतेने नटलेलं ठिकाण प्राणी पक्षासाठी उपयुक्त हे पाहून श्रीमंत छत्रपतींच्या राजवटीत येथे हत्ती महालाची उभारणी करण्यात आली. याचे काही जुने मोडी लिपीतली कागद ही आढळून येतात.एका बाजूला एका ओळीने पंधरा हत्ती असे चारी बाजूला उभारतील अशी चौसोपी इमारत होती. वरती चुनखडीची बांधणी बांधकाम करून ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण अशी दगडी बनावटीची इमारत. हत्तीची ये-जा यामुळे प्रवेशद्वारही दगडी उंच पद्धतीचे.हत्तींची स्वच्छता, मसाज,कसरती करता येईल यासाठी मध्ये मोठा चौक. याशिवाय माहुतांना राहण्यासाठी खोल्या असा अवाढव्य बांधीव परिसर यामुळे हत्तींचा महल अशीच ओळख.प्राचीन काळ, मोगल काळ यातील पीलखाना याचे मराठीकरण म्हणजे हत्तीमहाल. हत्तींचा तळ्याकाठी मुक्तसंचार हा एक कोल्हापूरच्या वैभवसंपन्नतेचा आविष्कार होता. काळाच्या ओघात हे संपले असले तरी काही इतिहासाच्या पाऊलखुणा शिल्लक आहेत याच बाबी अचेतन बाबींना सचेतन करण्यासाठी पुरेश्या आहेत. संध्याळे तळ्याच्या जागी अपार्टमेंट ,घर बांधकामातून थोडीही जागा शिल्लक नाही. जुना बाजार, मटन मार्केट, फिश मार्केट ,कोंबडी बाजार यामुळे विक्रेत्यांची भाऊ गर्दी यात हत्ती महालाच्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय अशा भर बाजाराच्या वस्तीमध्ये श्री त्रिसंधेश्वर मंदिर आपले भुतकाळ अस्तित्व गमावून बसले आहे. महानगर महानगरपालिकेकडून मटन मार्केट रस्त्याच्या मधोमध एका बाजूलाच उत्तराभिमुख हे शिवलिंग मंदिर आहे. दहा बाय दहा नंदीमंडप तर पंधरा बाय पंधरा गर्भगृह.उत्तराभिमुख शिवलिंग तसेच उत्तराभिमुख मंदिराचे प्रवेशद्वार अशी कमी मंदिरे आहेत यापैकी हे एक मंदिर आहे. एक्कवण शक्ती स्थानांपैकी महामाया देवीचे भैरव स्थान म्हणजे श्री त्रिसंधेश्वर मानले जाते. चतुर्थ जलाशय, चतुर्थ कल्लेश्वर याप्रमाणे दक्षिणकाशी क्षेत्र करवीर क्षेत्रातील एकाच नावातील साधर्म्य असणारे हे श्री भैरव स्थान आहे. आपण भैरव याला देवतेचे रूप दिले आहे. पण खरे पाहता ही मानवी अभिव्यक्तीची संकल्पना आहे. श्वास घेणे आणि सोडणे असा एक श्वास.या अभ्यासातुन पुढे पुढे जाऊ लागलो तर आपले श्वास वीस,सोळा,बारा,दहा यातून भैरव स्थिती यातून पुढे शिवमय अवस्था असा हा एक योगिक अभ्यास आहे.या योगीक प्रक्रियेमध्ये दक्षिण काशी क्षेत्रांमध्ये भैरव साधना स्थानमहात्म्य संकल्पना स्थापित आहेत.यापैकीच एक म्हणजे हे श्री त्रिसंधेश्वर महादेव मंदिर. प्राचीन मंदिराच्या ठिकाणी एक पाकी आर.सी.सी. मंदिर उभा करून सुंदर व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.शहरातील भरमध्यवस्तीचे ठिकाण बाजारपेठ असली तरी मंदिरातील गर्भगृहात पटकन आत्मकेंद्रित होता येते अशी विलक्षण प्रसन्नता इथे आहे. करवीर नवदुर्गांपैकी एक दुर्गादेवी ही हत्ती महाल परिसरात आहे. हस्तलिखित ग्रंथांचा प्रचंड खजिना, याचबरोबर अनेक ग्रंथ लिहिणारे दक्षिण काशी क्षेत्रातील पंडित घराणे म्हणून ज्यांची ओळख असे काशीकर यांचेही निवासस्थान या श्री त्रिसंधेश्वर मंदिराजवळ होते. आज या फक्त आठवणी आहेत. काशीकर यांचे घर- वाडाही नाही, संध्याळे तळेही नाही तसेच हत्तीमहाल ही नाही. पण प्राचीनतेची साक्ष देणारे श्री त्रिसंधेश्वर मंदिर मात्र आपले अस्तित्व टिकवून आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील श्री त्रिसंधेश्वर महादेव मंदिर.

श्री द्विसंध्येश्वर महादेव मंदिर.


श्री द्विसंध्येश्वर महादेव शिव पिंडी.

श्री द्विसंध्येश्वर महादेव मंदिर गर्भगृहातील श्री नंदी मूर्ती.

श्री द्विसंध्येश्वर महादेव मंदिरातील संगमरवरी श्री नंदी मूर्ती.
श्री द्विसंध्येश्वर महादेव मंदिर संगमरवरी भिंतीत बसवलेले विरगळ,

श्री द्विसंध्येश्वर महादेव मंदिर गर्भगृहातील संगमरवरी श्री गणेश मूर्ती.
श्री द्विसंध्येश्वर महादेव मंदिर चौकटी वरील शिल्प तसेच र्किर्तिमुख.

श्री द्विसंध्येश्वर ;-

 दक्षिणकाशी क्षेत्र करवीर ,कोल्हापूर येथील प्राचीन स्थानमहात्म्य दर्शवणारे विज्ञाननिष्ठ परंपरेतील मंदिर म्हणजे श्री द्विसंध्येश्वर महादेव मंदिर. कोल्हापूर शहरामध्ये श्री संध्येश्वर नावाची तीन महादेवांची मंदीरे आढळून येतात. यातील क्रमांक एकचे मंदिर म्हणजे रंकाळा शेजारी प्रिन्सेस पद्माराजे उद्यान आहे या तळ्या शेजारी असणारे प्राचीन शिव मंदिर म्हणजे श्री संध्येश्वर मंदिर, याचबरोबर आता सध्याची गुजरी येथे संजाळ तळे होते या तळ्याकाठी असणारे मंदिर म्हणजे श्री द्विसंध्येश्वर महादेव मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,भेंडे गल्ली शेजारी बोळातुनही या महादेव मंदिराकडे येते. आणि तिसरे मंदिर म्हणजे श्री त्रिसंधेश्वर. मटन-फिश मार्केट ,हत्ती महाल सध्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालय या शेजारी असणारे महादेव मंदिर म्हणजे हे श्री त्रिसंध्येश्वर महादेव मंदिर. शहरी मानवी वस्ती साठी जीवनदायिनी असणारी हि तीन पाण्याची तळी होती. नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण अशा वनस्पती या तळ्यात तसेच तळ्याकाठी होत्या म्हणूनच या तळ्यांना संजाळ म्हणून ओळखले जात होते. यामुळेच या तळ्याकाठी असणाऱ्या श्री महादेव मंदिरास श्री संध्येश्वर म्हणूनच ओळखले जात होते. पाचशे कोटीहून अधिक अनुभव असणाऱ्या निसर्गा ची रचना ही परिपूर्ण आहे हे आता विज्ञानानेही मान्य केले आहे. मनुष्य शरीर रचना पाहिली तर नव्वद टक्क्यांहून अधिक आजार हे अशुद्ध पाणी यामुळे होतात हे ही निष्पन्न झाले आहे. तर ही तळी अशुद्ध पाण्याची झाली, निसर्गाचा र्हास झाला की प्रदूषण तयार होते, प्रथम मासे, बेडूक, डास तयार होतात. नंतर मलेरिया डास ,डेंगू डास हे मानवी आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहेत. यावेळी शुद्ध पाण्याची तळी, नैसर्गिक देणगी असणारी ही तीन पाण्याची तळी म्हणजे संजाळ तळी म्हणून ओळखली जात होती. तशा नोंदी जुन्या कागदपत्रांमध्ये ही आढळून येतात.
देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे म्हणत असताना मानवी जीवन शैली साठी उपयुक्त असणारी हि स्थान महात्मे ,गुणवैशिष्ट्ये, विज्ञाननिष्ठता या बाबी मागे पडल्यामुळेच नेमकेपणातून मंदिरप्रणाली महत्त्व समजून घेण्यामध्ये आपण कमी पडत आहोत. आजच्या काळात जागतिक महामारी ला सामोरे जावे लागत आहे. ऑक्सिजन कमी होणे या बाबी येथे दिसून येत आहेत. या वेळी या तळ्यात तसेच तळ्याकाठी अशा काही वनस्पती होत्या की या वनस्पती ऑक्सिजन तयार करायच्या. हवेत एकवीस टक्के ऑक्सीजन आहे यासाठी तसेच मानवासाठी गरजेपुरता ऑक्सिजन याचबरोबर शुद्ध पाणी करण्यासाठी या वनस्पती उपयुक्त ठरायचा. वाढतं शहरीकरण यामध्ये या वनस्पती आज नष्ट झालेल्या आहेत. पण या तळ्याकाठी असणारी प्राचीन शिव मंदिरे मात्र आजच्या काळातीही येथे पहावयास मिळतात गुजरी मधील संजाळ तळे नष्ट होऊन त्याची जागा आता सोन्या-चांदीचे छोटे छोटे दुकान गाळे, भरगच्च लोकवस्ती, बाजारपेठ यांनी व्यापून टाकली आहे. येथे असणारे महादेव मंदिर यामुळे येथून शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या छोट्या बोळास महादेव गल्ली असेही म्हणतात. प्राचीन यादवकालीन श्री द्विसंध्येश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न आहे. आतून आणि बाहेरून संपूर्ण मंदिर शिखरासह संगमरवरी फरशी मार्बल ने अच्छादलेले आहे. जुन्या मंदिराशेजारी अस्ताव्यस्त पडलेले वीरगळ यांचे महत्त्व फारसे लक्षात न आल्यामुळे मंदिर संगमरवरी बांधकाम यातच ही वीरगळ बसवलेली दिसून येतात. या वीरगळांची संख्या सर्व साधारण वीस एक पेक्षाही अधिक आहे. प्रथम पंधरा बाय पंधरा नंदीमंडप, या नंदी मंडपातून पाच सात पायऱ्या उतरून तळघरात गेल्याप्रमाणे गर्भगृहात जावे लागते. उत्तराभिमुख मंदिर यामुळे पायऱ्या उतरताच भव्य उत्तराभिमुख शिवपिंडी चे दर्शन घडते. नंदी मंडपात भव्य संगमरवरी श्री नंदी मूर्ती तर गर्भगृहात ही शिवपिंडी शेजारी काळ्या पाषाणातळ् छोटेखानी श्री नंदी मूर्ती येथील दिसून येते. समोरील देवळी मध्ये दोनएक फुटांची संगमरवरी श्री गणेश मूर्ती येथे दिसून येते. एकपाकीच पण टुमदार असे हे मंदिराचे स्वरूप आहे. मंदिरासमोर वीस बाय तीस अशी खुली जागा ही आहे. याला छोटेखानी लोखंडी ग्रील-कठडा करून दुचाकी वाहन पार्किंग पासून मंदिर परिसर थोडा का होईना पण सुरक्षित ठेवला आहे. असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर,कोल्हापुर येथील श्री द्विसंध्येश्वर महादेव मंदिर.





Sadguru Chile Maharaj Temple, Paijarwadi

(20 KM from Kolhapur on Kolhapur – Ratnagiri Road)

Chile Maharaj was a famous saint in the region surrounding Kolhapur.

He preached cultivation of pure thoughts, heartfelt devotion and

Passionlessness to multitudes of his devotees.

After his heavenly demise, his devotees decided to construct a tortoise shaped temple around his Samadhi, because in his discourses he asked his followers

to emulate the tortoise – which pulls itself in when confronted with any danger.

Theemulation for humans meant drawing yourself away from the worldly passions.

With this in mind the devotees decided to have a temple in a tortoise form,

in the year 1997. A renowned Architect in the region Ar. Pramod Beri

was approached and the temple work started based on his vision.

This unique tortoise shaped columless temple has a size of 25 metre x 35 metre (about 80 Feet x 120 Feet). The experience inside the temple is breathtaking with a ovoidal volume of 12 metre heighted (40 feet) ceiling which kind of represents the sky and the stars. In the walling there are planets like punctuations.

The Guru’s Samadhi proper is situated in a smaller sunken space inside the hall, which answers the devotee to deity one to one relation as per the Hindu tradition.

His Guru Garadebaba’s Samadhi is right behind the temple and is also worth

a visit. The external “pradakshina” (circulambutory) has ‘mini domed’ rooms for storage purposes.Pink sandstone is the dominant material of construction.

In the year 2005 the project won “Outstanding Structure Award” from the India Chapter of American Concrete Institute. Hence this is a must visit unique builtform just at 40 minutes drive from Kolhapur and 20 minutes drive from Panhala.

 

श्री गयेश्वर - दक्षिण काशी

श्री गयेश्वर - दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान महात्म्य लाभलेले, विविध प्राचीन धर्मग्रंथात उल्लेखित असलेले मंदिर म्हणजे श्री गयेश्वर मंदिर.

कोल्हापुरातील सोमवार पेठ येथील देशभूषण हायस्कूल, दिशा डायग्नोस्टिक सेंटर समोरील मंदिर म्हणजे श्री गयेश्वर मंदिर होय. दसरा चौक येथील मुस्लिम बोर्डिंग येथून लक्ष्मीपुरीकडे जाताना पहिलाच फाटा असणारा रस्ता येथे रद्दी-कागद विक्रीची मोठी दुकाने आहेत. या शेजारीच हे मंदिर आहे. "करवीरमहात्म्यस्थतीर्थदेवता" या प्राचीन ग्रंथामध्ये 'गया पूर्व दिग्भागे फलगुतीर्थ सन्गिधौ गधाधर रुपो विष्णुः।तस्येव पूर्वतःविष्णुदं' असे उल्लेख आढळून येतात. आता सध्या महानगरपालिकेने कदमवाडी भाग विकसित केला आहे. हा भाग म्हणजे श्री गयेश्वर तसेच रुद्रगया यासाठी राखीव ठेवलेली जमीन होती. या जमीनीतून येणाऱ्या उत्पन्नातून धार्मिक उत्सवाचा खर्च खर्ची पडत असे. तशा अनुषंगाचे संस्थानकालीन मोडी लिपीतील कागद वाचता आले. नंतरच्या काळात हे मंदिर श्री सारडा यांच्या आप्तजनाकडे आले. आज श्री फल्गुलेश्वर मंदीर हे पहावयास मिळते. आज फल्गु नदी कोल्हापूरच्या इतिहासातून लुप्त झाली आहे. पण फल्गु नदी या क्षेत्रातून वहात होती असे उल्लेख आढळून येतात. जमीन सपाटीपासून पाच ते सहा फूट खाली असणारे हे मंदिर आज जुन्या काळातील स्थानमहात्म्य दर्शवते.

काशी, गया आणि प्रयाग ही स्थाने मुक्तीस्थान असल्यामुळे अनेक महनीय व्यक्ती, साधू यांनी या स्थानी येऊन साधना केली आहे. या ठिकाणी येथे श्री गयेश्वर स्थाना बरोबर इथे काही दगडात कोरलेले पाय- पादुका आढळून येतात. गधाधारी श्री महाविष्णूची मूर्ती याच बरोबर येथे एक पाय विष्णूपदं तर एक-एक पाय- पादुका हे श्री जमदाग्नी, ब्राह्मण, अत्री, चंद्र, इंद्र, कश्यप, गरुड,गणेश, आहवनीय, गार्हपत्य, अग्नि, आदित्य, कार्तिकेय, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथव्रण, अगस्त्य, गर्ग अशी पदकमले दर्शवली आहेत.बारा बाय बारा दगडी एकपाकी प्राचीन मंदिर आणि उंचीही जेमतेम तेवढीच. या मुख्य मंदिरा सभोवती सर्वसाधारण तीस बाय साठ आर.सी.सी. मंडपवजा एक मजली इमारत उभा केली आहे. या मडंपामध्ये कोटा फरशी बसवली असून या मंडपाच्या मधोमध असणाऱ्या या मंदिरात पाच-सह् पायर्या उतरून खाली जावे लागते. या मंदिरा शेजारीच दहा बाय दहा आकारातील श्री लक्ष्मीनारायणाचे खूप छान मंदिर उभा केले आहे. संगमरवरी दगडातील सुंदर श्री मुर्ती खूपच आखीव-रेखीव आहेत.

सत्संग सेवा केंद्र, सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या रुपाने मंदिर परिसर खूपच सुंदर ठेवला आहे. या परिसरात जुन्या काळातील मंदिराचे कोरीव दगड आढळून येतात. हे दगडी शिल्प तसेच प्राचीन मंदिराचे खांब हे अप्रतिम कोरकीपणाची उदाहरणे आहेत. दक्षिण काशी क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान असून सुद्धा मुख्य रस्त्याशेजारी मंडप वजा इमारत आणि आत मध्ये लक्ष्मीनारायण मंदिर, श्री सत्यनारायण मंदिर एवढीच ओळख सद्यस्थितीत शिल्लक राहिली आहे.

असे हे दक्षिण काशी क्षेत्र करवीर येथील प्राचीन स्थान लाभलेले श्री गयेश्वर मंदिर.

उदयसिंह मानसिंगराव राजेयादव,कोल्हापूर-औरंगाबाद, मोबाईल नंबर - ९३७०१०१२९३.

कोल्हापूरचे मूर्ती वैभव

कोल्हापूर आणि आजूबाजूचा परिसर हा मूर्ती कलेची समृद्धी सांगणारा आहे. मनोबल आणि शारीरिक शक्तीचे प्रतीक म्हणजे श्री हनुमान. जवळपास प्रत्येक गावात किमान एक, काही गावात तर एका पेक्षा जास्त हनुमानाची मंदिरं पाहायला मिळतात. आपलं कोल्हापूर याबाबतीतही वैशिष्ट्य राखून आहे. श्री हनुमंताची म्हणजेच मारुतीची विविध रूपं कोल्हापूर परिसरात पाहायला मिळतात. त्यातील काही प्रसिद्ध आहेत तर काही अप्रसिद्ध. अशाच काही अप्रसिद्ध पण वैशिष्ट्य पूर्ण मारुती च्या मूर्तीं बद्दलची माहिती इथं देत आहोत. कोल्हापूर मध्ये प्रचलित रूपात उभा मारुती आहे, सोन्या मारुती आहे. त्याच बरोबर कोल्हापूर परिसरामध्ये मारुतीची अनेक विलोभनीय रूप आपल्याला पाहायला मिळतात. मारुतीच्या  या  स्वरूपांचं वर्णन असलेलं हे सदर.

आई अंबाबाईच्या कृपाशीर्वादाने कोल्हापूरची माहिती, महती आणि समृद्धी याची गुंफ शब्दरूपात करून तुमच्या समोर सादर करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. कोल्हापुरातील ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक श्री. उमाकांत राणिंगा (संपर्क - ९८९०१४४६१०) यांच्या मार्गदर्शनाने हा संकल्प पूर्णत्वास जात आहे.
   
 

Renuka Devi Temple

Sri Renuka Devi Murti
Sri Renuka Devi Murti

Renuka Devi who is a form of Mahasaraswati is located on the other side. It is a small but very interesting one. It has a smaller mandir dedicated to Parshuram who is the son of Renuka & Rishi Jamdagni. Another one is dedicated to Matangi Devi.

Renuka-Jamdagni Wedding Invite
Renuka-Jamdagni Wedding Invite

Renuka Devi here is believed to be a form of Yellama Devi too.

I discovered an interesting ritual here. Celebrating the wedding of Renuka and Jamadagni. A board outside announced an open invitation for the wedding that was due in a few days. I had seen a similar wedding invitation for Rukmini Vivah in Dwarka.

Tulja Bhawani Mandir at Bhawani Mandap

Tulja Bhawani Mandir at Bhawani Mandap
Tulja Bhawani Mandir at Bhawani Mandap

Bhawani Mandap is the old Palace. Tulja Bhawani is the Kuldevi, the family deity of the royal family of the region. Her mandir continues to be in the old palace premises though the palace itself moved to a new palace in Kolhapur.

I remember seeing the Tula Bhawani temple on Panch Kroshi Yatra in Kashi.

The open courtyard is where I got to see Dand Patta or the martial arts by the Maratha women during my earlier trip to the city. Watch the video:

Triambuli or Temlai Devi Temple

This is a small one located a few kilometers away. This is the mandir the goddess Mahalakshmi visits Lalita Panchami on the 5th day of the Navratri.

Triambuli Devi Temple
Triambuli Devi Mandir

The story goes that when Mahalakshmi was fighting Asura Kolhasur, she was assisted by the daughter of the ruler here. However, after the fight was over, Devi forgot about her and the girl was annoyed. So, Devi visited her and blessed her that she would be worshipped in Kolhapur. She also promised that she would pay an annual visit to her mandir. The tradition continues.

Triambuli or Temlai Devi Idol
Triambuli or Temlai Devi Idol

Triambuli Devi or Temlai as she is fondly called is treated as the younger sister of Mahalakshmi.

There is also a mandir dedicated to Magai Devi close by.

Kapileshwar or Kapil Tirth Mandir

Kapileshwar Mandir or Sri Kapil Tirth - Kolhapur
Ancient Kapileshwar Mandir or Sri Kapil Tirth

Not too far, there is a Mandi or the vegetable market. We walked into the market just out of curiosity or maybe some divine forces led us to it. We discovered a small but ancient Kapileshwar Mandir here. Standing on typical Chalukyan pillars it is an ancient Shiva temple.

Later, at the town hall museum, we discovered many artifacts that have been discovered from an excavation that was carried out in this complex. We also learned that the market is at a place where the temple tank used to be.

In fact, all the temple tanks of the city no longer exist.

Sri Yantra Carved on a Linga
Sri Yantra Carved on a Linga at Town Hall Museum in Kolhapur

My biggest discovery was a Sri Yantra carved on the Yoni like a Shivalinga usually is. This is a unique carving that I have not seen anywhere else.

At the museum, I realized how big the pilgrimage center or Shakti Khsetra of the city must have been at some point in time           
   
तुरंबे (जिल्हा कोल्हापूर) येथील गहिनीनाथ मंदिराच्या खालील जमीनीत दोन तळघर आणि चार गुप्त रस्ते सापडलेले आहेत. याची माहिती व छायाचित्रे मिळतील का?

या भागाशी मी परिचित आहे म्हणून उत्तर देतोय. उत्तरासाठी व यातील छायाचित्रांसाठी ज्या बातम्यांचा आधार घेतला आहे त्याची लिंक उत्तराखाली जोडलेली आहे.

तुरंबे गावापासून साधारणपणे दीड किमी अंतरावरील टेकडीवर ग्रामदैवत गहिनीनाथ आणि भैरवनाथ मंदिर आहे. याला स्थानिक भागात गैबी पीर मंदिर असेही म्हणतात.

या मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना तिथे जमिनीत गुहा आणि दोन खोल्यांचे तळघर आढळून आले आहे असे रिपोर्ट्स आहेत. यामध्ये दगडी खांब, जुन्या काळातील चौकटी, जुन्या काळातील दिवे, पणत्या हे साहित्य व यासोबतच सरपटणाऱ्या प्राण्यांची अंडीही आढळून आली आहेत. हे तळघर जमिनीपासून खाली दहा ते बारा फुट अंतरावर आढळले. याला पुढे जाण्यासाठी दोन भुयारी मार्ग आढळून आले आहेत. पण बरीच पडझड झाल्याने मातीचे ढीग दिसून येतात. बराच अंधार सुद्धा आहे. अर्थातच भुयारातून पुढे जाणे धोक्याचे आहे.

हि वास्तू साधारणपणे दोनशे वर्षापूर्वीची असण्याची शक्यता आहे.

इथून चार ते पाच किमी अंतरावर (थेट अंतर) चक्रेश्वरवाडी नावाचे छोटे गाव आहे. हे भुयार तेथील महादेव मंदिराला जोडले गेले असल्याची आख्यायिका या भागात गेली अनेक वर्षांपासून लोक सांगतात. तर दुसरे भुयार तुरंबे गावाला जोडले आहे असे म्हणतात.

या भुयाराचे पुरातत्व खात्याकडून रीतसर उत्खनन करावे अशी मागणी केली जात आहे.

संबंधित व्हीडीओज:

तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे गहिनीनाथ मंदिरा चे खाली दोन तळघर व तळ घरामध्ये चार गुप्त रस्ते सापडले आपणा सर्वांना कळविण्यात अतिशय आनंद वाटतो की तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे ग्रामदैवत गहिनीनाथ व भैरवनाथ जी यांच्या मंदिराच्या शेजारी मंदिराचा विकास करत असताना उत्खनन करत असताना दोन तळघर व त्यामध्ये चार भुयारी रस्ते असे दिव्य मार्ग सापडले आहेत या संदर्भात ओम ब्रह्मा चैतन्य नवनाथ सेवा संस्था चे योगी संजय नाथ सेवक व सद्गुरु गोरक्षनाथ सेवा चारीटेबल ट्रस्ट चे रवी नाथ महाराज यांनी प्रत्यक्ष जाऊन गहिनीनाथ मंदिर या पवित्र स्थानाची पाहणी केली यावेळी तुरंबे गावातील दयानंद भोईटे व काही ग्रामस्थ यांचे मदतीने सद्गुरू गहिनीनाथ आणि भैरवनाथ मंदिराच्या शेजारी एक गुहा सापडली असून गुहे मधून आत प्रवेश केल्यानंतर तळ घरांमध्ये दोन खोल्या सापडल्या असून आत मध्ये चार वेगवेगळे रस्ते असल्याचे दिसत आहे तरी सर्व भक्तांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा व संस्थेतर्फे पुरातत्व विभागाला विनंती की सदर गहिनीनाथ मंदिराचे तळ दरासंदर्भात भुयारी मार्गाचा संदर्भात उत्खनन करून लोकांना भक्तीमार्गाची आवड होणे संदर्भात त्याचा विकास करावा असे प्रतिपादन योगी संजय नाथ सेवक व रवी नाथ महाराज यांनी केले यासंदर्भात अधिक माहितीसाठी योगी संजय नाथ सेवक 98 22 10 74 76 रवी नाथ महाराज 84 21 829950 व दयानंद भोईटे मुक्काम पोस्ट तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांचेशी संपर्क साधावा सदर माहिती जास्तीत जास्त भक्तांच्या पर्यंत पोहोचवून सहकार्य करावे ही विनंती

 
 
 
 
 
 
 
  

Monday, January 1, 2024

पाटणे येथील महेश्वर मंदिर

  पाटणे येथील हे मंदिर जगती वर उभे असून मुख मंडप अर्धकुला मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविण्यास आहे. गर्भगृहाचा तलगिन्यास पंचरता प्रकारचा असून तारकाकृती आहे. अर्ध खुदा मंडप अनेक थर असलेल्या पिठावर असून पिठाच्या सगळ्यांवरच्या भागावर गज थर आहे. अर्ध खुल्या मंडपाला तिन्ही बाजूंनी वामन भिंती असून त्याच्या राजसेनाकाचे स्वरूप कीर्ती मुखांचा पट्टा असे आहे. या पट्टावर कक्षा संयुक्त वेदिका आहे. कक्षा सणाचे उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील आकृती शिल्प होय. गर्भगृहाच्या भद्रभागामधील देवकुष्टांमधील महिषासुरमर्दिनी आणि भैरव या मूर्तींचा अपवाद वगळता गर्भगृहाच्या बाह्य अंगावर मूर्ती नाहीत.
  पिठावर अनुक्रमे खूर जाडंब कुंभ आणि कपोत असे थर आहेत. कपोथावर गज थर आहे. मंडोवराच्या तळ भागात जाडंभ कुंभ कलश आणि कपोत असे थर आहेत. त्यावर जंगबाज असून तो स्तंभकुठाने अलंकृत केलेला आहे. गर्भगृहाच्या द्वाराला सहा शाखा असून त्यावर अनुक्रमे १) पद्मपट्टा  २) वादक ३)  ४) व्याल ५) कमळाच्या पाकळ्या व ६) चौकशी आणि गोलकांची नक्षी असे अलंकार आहे. गणेश असून उत्तरांगातील प्रतिकांमध्ये सप्तमातुरकांपैकी तीन मातृ का आणि गणेश भैरव आहेत. या मंदिरांची वास्तुशाली द्वार स्तंभ घटक क्रम आणि मंडोवर लक्षात घेता हे मंदिर ईसचा १२ व्या शतकाच्या अखेरीस बांधले गेले असे अनुमान करता येते. शके १०७५ चा लेक आहे. इस ११५३-५४ चा लेख निकुंभ नृपती इंद्राराज वन द्रोपती गावंचा आहे.

पाटणे येथील पंचायतन

 पाटणे गावाच्या हद्दीत आणि सातमाळा टेकड्यांच्या पायथ्याशी नदीच्या तीरावर हे पंचायतना आहे. हे पंचायतन आई भवानी मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात यादवांचा मांडलिक असलेल्या सोयदेवाचा शिलालेख आहे. हा सोईदेव यादव द्रुपती सिंगणाचा समकालीन असून शिलालेखात त्याने चांगदेव नामक राज ज्योतिषाच्या अधिपत्याखाली असलेल्या मठास दिलेल्या देण्यांचा उल्लेख आहे. या शिलालेखावरून सदर मंदिर इस. १३ व्या शतकाच्या सुरुवातीस शके ११२८ म्हणजे  ९ ऑगस्ट १२०७ च्या सुमारास बांधले गेले असावे. या लेखात निकुंभशातील सोईदेव व हेमाडी देव व यादव द्रुपती सिंघम याचा उल्लेख आहे. लेखाचा हेतू सिंगणाचा राज ज्योतिषी चांगदेव याचा आजार भास्कराचार्य याने रचलेल्या सिद्धांत शिरोमणी व इतर ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी मठाची स्थापना करण्याविषयीची नोंद करणे हा आहे.
    हे मंदिर खूप लोकप्रिय असल्याने आणि दरवर्षी येथे मोठी जत्रा भरत असल्याने मध्ययुगीन आणि ब्रिटिश काळात त्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. सध्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर एक सज्जा लागतो. आणि या सज्जा मागे हे मंदिर आहे. चार गर्भग्रहांना समाईक असलेल्या लंब चौकोनाकृती खुला मंडप असे मंदिराचे सध्याचे स्वरूप आहे. यापैकी तीन गर्भगृहे मंडपाच्या एकाच बाजूस एकाच दिशेला अभिमुख असून चौथे गर्भ ग्रह या तीन गर्भगृहांच्या काटकोनात मंडपांच्या अरुंद बाजूला लागून आहे. पण या चौथ्या गर्भगृहासमोरील मंडपाच्या दुसऱ्या अरुंद बाजूला लागून आणखी एक गर्भगृह होते हे सिद्ध करण्याइतपत पुरावा किंवा अवशेष आजही शिल्लक आहेत. आधी नमूद केल्याप्रमाणे या मंदिराची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती होताना त्यात अनेक बदल झाले आहेत. काही मंदिर घटकांचे तर आकारही बदलले असण्याची शक्यता आहे. परिणामी आज या मंदिराकडे पहिले असता ते आधुनिक काळात बांधलेले मंदिर वाटते. याआधी वेसर आणि फासना प्रकारचे शिखर असलेल्या मंदिरांचे विवेचन करताना फासना प्रकारचे शिखर असलेल्या विष्णूच्या गर्भ ग्रुप हा ची आणि दक्षिणेकडील वेसर शिखर असलेल्या गर्भगृहाची चर्चा आपण केलेलीच आहे. ही मंदिरे मुळात कशी असावीत याची साधारण कल्पना क्रूझीन कृत मेडिकल टेंपल्स ऑफ द डेक्कन या ग्रंथात दिलेल्या छायाचित्रावरून येऊ शकेल. या मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण तळीविन्यासामुळे त्याची या प्रकरणात आवर्जून चर्चा केली आहे. कारण सामान्यपणे मध्यभागी मुख्य मंदीर किंवा मुख्य आयातन आणि याच्या चारही बाजूंना काही अंतर सोडून चार उप आयातने असेच पंचायतनाचे स्वरूप असते. सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर याचा उत्तम नमुना आहे. पण येथे मात्र पाचही आयातने लंब चौकोनाकृती खुल्या मंडपाच्या तीन बाजूंना जोडून आहेत.

फासनाकार शिखरे मंदिराच्या विमानावर नसून मंडपावर किंवा अर्धमंडपावर आढळतात. यावरूनच हा शिखर प्रकार भव्य आणि सौंदर्य संपन्न शिखरासाठी अस्तित्वात आला नाही हे स्पष्ट होते. मंदिर संकुलातील दुय्यम मंदिरांवर विशेषतः एका ओळीत असलेल्या मंदिरांवर आढळणारी फासनाकार शिखरे वरील निष्कर्ष पक्का करतात. फासना शिखरांना दिले जाणारे दुय्यम महत्त्व हेही समाधी मंदिरांकरता होणाऱ्या या शिखराच्या वापराचे प्रमुख कारण असू शकेल.
 पाटणे येथील पंचायतन संकुलातील विष्णू मंदिर हे प्राचीन फासना मंदिराचे एक उदाहरण आहे. हे एक निराळ्याच प्रकारचे पंचायतन आहे आज उपलब्ध असलेल्या अवशेषावरून मध्यभागी लंब चौकोनी मंडप, त्याच्या मागील बाजूस मंडपाला जोडून एका जवळ एक अशी तीन गर्भगृहे आणि मंडपाच्या दोन अरुंद बाजूला जोडून प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे एकूण दोन गर्भगृहे असे या पंचायतनाच्या स्वरूप असल्याचे लक्षात येते. मागील तीन गर्भगृहापैकी मधले गर्भगृह विष्णूचे असून त्यावर साधे फासणा शिखर आहे. इतर आयतनांवर हे असेच शिखर होते का ? हा संशोधनाचा विषय आहे. हेन्री कझिन्स लिखित 'मेडिव्हियल ऑफ डेक्कन' या ग्रंथात प्लेट क्रमांक मध्ये या पंचायतनाच्या मागच्या बाजुचा हा फोटो दिलेला आहे. तो पाहून याबाबत फक्त तर्क करता येणे शक्य आहे.


समुद्रसपाटीपासून ६६० मीटर ( २१६५ फुट ) उंचीवर असणाऱ्या या गडास भेट देण्यासाठी चाळीसगाव या तालुक्याच्या गावी पोहोचावे लागते. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उघडे असते. पाटणादेवी हे या भागातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्यामुळे चाळीसगावच्या बसस्थानकावरून सकाळी ७.३० पासून दर तासास एक याप्रमाणे (चाळीसगाव-पाटणादेवी अंतर १८ कि.मी.) बस सुटतात.  त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत. 
आपण बसने साधारण पाऊण तासाचा प्रवास केल्यानंतर पाटणे नावाचे गाव लागते. येथून बसने आपण सरळ पाटणादेवीला न जाता पाटणादेवीच्या अलीकडे दीड कि.मी. अंतरावर असणाऱ्या महादेव मंदिर बसथांब्यावर पायउतार व्हायचे.

कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्‍या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. पाटणा गावाच्या पुढे रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो. 

 

 ८ फूट उंच दगडी चौथर्‍यावर हे पूर्वाभिमुख मंदिर उभे आहे. चौथर्‍यावर फरसबंदी केलेली आहे. या चौथर्‍यापसून ६ फूट उंचीवर मंदिर बांधलेल आहे.मंदिराच्या आसपासच्या परिसरात दिसणारे कोरीव दगड व इतर अवशेष पहाता या ठिकाणी केवळ एकच मंदिर नसुन मंदिरसमुह व मोठया प्रमाणात वस्ती असल्याचे दिसुन येते.

 मंदिर ७५ फूट लांब ,३६ फूट लांब ,१८ फूट उंच आहे. केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे या मंदिराचा ताबा असून त्यांनी तसा निळा फलक लावला आहे. या मंदिराची भव्यता नजरेत भरण्यासारखी आहे . मंदिर परिसरात अनेकठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात . त्यांचे उत्खनन झाल्यास खूप मोठा पुरातत्वीय इतिहास जगासमोर येऊ शकतो . यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषांवरून लक्षात येते .
या पुरातन मंदिराभोवती दगडी भिंत असून त्यावर काटेरी तारांचे कुंपण लावलेले आहे.पुरातत्व विभागाने मंदिराकडे जाणारा घडीव दगडातील मार्ग बांधून काढला आहे.मंदिराच्या विशाल प्रांगणात शेंदुर विलेपित हनुमानाची मुर्ती भाविकांनी स्थापन केलेली आहे.
मंदिराच्या सभोवती कडुनिंब्,चिंच, बोरी-बाभळी याची झाडी असून या वृक्षांवर काळतोंडे लंगुर बसलेले पहायला मिळतात.
    प्रांगणाच्या मधोमध आठ पायर्‍यांच्या उंचीचा घडिव दगडातील चौथरा असून त्यावर आठ पायर्‍या चढून गेले कि मुख्य मंदिरात प्रवेश होतो. मंदिराचे द्वारमंड्प,सभामंडप, अंतराळ व गर्भगृह, असे चार भाग आहेत. 

 नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आपले लक्ष वेधून घेतात . छताचा अवजड भार त्यांनी अगदी लीलया पेलून धरला आहे . 

द्वारमंडपापुढे नंदीमंडप असून त्यात नंदीचे सुंदर शिल्प आहे.सभामंडप विशाल असून आतमध्ये चार खांबांच्या तीन रांगा आहेत.
 

मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे . साधारणपणे २४ खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली दिसते प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे . खांबांवरील तुळया त्यांचे जोतरे त्यावर रचलेले आयताकृती दगड , सगळं कसं अगदी जुळवून आणलंय . अतिशय कसलेल्या मुरब्बी कारागिरांच्या हातून या कलाकृतीचे निर्माण झाले आहे . प्रत्येक चौकीतील छताच्या रचनेत वैविध्य जाणवते .कित्येक टन वजनाच्या या प्रचंड शिळा जमिनीपासून २५ फुटांपेक्षा अधिक उंचीवर उचलून अलगदपणे बसवलेल्या बघतांना त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानामुळे मन थक्कच होते .



स्तंभावर व भिंतीवर कीर्तिमुख व  इतर कोरीव शिल्प आहेत.बाजुच्या एका शिलालेखावर 'शके १०२५' हि अक्षरे वाचता येतात.
गर्भगृहाच्या पट्टीवर गणपती , सप्तमातृका कोरलेल्या आहेत. मंदिराच्या छ्तावर नक्षी बनवलेली आहे. गर्भगृहाच्या बाहेर जमिनीवर कोरलेली शंख व चक्र ही विष्णू आयुधे बघतांना मनात कोडे निर्माण होते .प्रवेशद्वाराच्या पायथ्याला मेंढ्यांची शिंगे व सिंहाचा जबडा असलेला बटबटीत डोळ्यांचा किर्तीमुख लक्ष वेधून घेतो . त्याच्या दोन्ही बाजूला असलेली शिल्पे पुसट असल्याने नीट आकलन होत नाही . प्रवेशद्वारावर श्रीगणेश विराजमान असून सप्तमातृका कोरलेल्या आहेत .तसेच गणसेना दिसते चौकटीवर यक्ष गंधर्व किन्नर गायन वादन व नृत्य करतांना दिसतात .

गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो . त्यावरील अक्षरांची ठेवण व एकसंधता पाहून कलाकारांना प्रणाम करावासा वाटतो . आज या शिलालेखाला कुठलेही संरक्षण कवच नाही . त्यामुळे पर्यटकांच्या भक्ष्यस्थानी तो पडेल की काय अशी भिती वाटते .( कुतूहल म्हणून प्रत्येकजण त्याला हात लावतोच ) म्हणून काचेच्या शोकेसमध्ये त्याला बंदिस्त केल्यास एक समृद्ध वारसा सुरक्षित राहील . काही ठिकाणी त्याचे पापुद्रे पण निघत आहेत.
गर्भगृहात शंकराची पिंड आहे.  गर्भगृहाचा आकार चंद्राकृती असून मध्यभागी असलेली शिवपिंडी मन प्रसन्न करते आत बराच अंधार असल्याने सुरुवातीला काहीच दिसत नाही .पण नंतरमात्र हळूहळू दिसायला लागते याला आतून २८ कोपरे आहेत .

आता आपण प्रदक्षिणा करणार आहोत . प्रदक्षिणा करतांना मंदिराची भव्य दिव्यता नजरेत भरते . मंदिराची भौमितिक संरचना वाखाणण्याजोगी आहे .बाहेरून दगडी स्तंभ उभारतांना सरळ रेषेत न उभारता त्रैमितीक रचना पध्दतीचा वापर केला आहे . प्रत्येक खांबाचा जोड हा विलग आहे ( समजा कालांतराने एखादा खांब ढासळला तर तितकीच जागा रिक्त होईल .पण मूळ वास्तूला कुठलीही हानी पोहचणार नाही याची काळजी वास्तू उभारतांना घेतलीआहे .)




स्तंभावरील कोरीवकाम अप्रतिमअसून उठावदार शैलीतील मूर्तिकाम नजर खिळवून ठेवते . उठावदार शैली शिल्पांवर शेकडो वर्षाचा ऊन वारा पाऊस यामुळे परिणाम झालेला दिसतो .अनेक शिल्पे झिजलेल्या अवस्थेत आहेत . काहीचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही .तर काही शिल्पे मानवी हस्तक्षेपामुळे विद्रुप झालेली दिसतात . काही हौशी गवशी मंडळी शिखराच्या अर्ध्यावर चढून आईलपेंटने स्वतःची इंग्रजी आद्याक्षरे लिहून पापाचे भागीदार झालेले दिसतात . यांना वेळीच आवर घातला गेला पाहिजे .
मंदिर प्रदक्षिणा मार्गावर तारेच्या जाळीचे कुंपण घालून अशा नतद्रष्ट लोकांपासून काही शतके मंदिर वाचवता येईल .जेणेकरून भावी पिढीसाठी हा वारसा जीवंत राहील .( ही वास्तू पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने त्यांनी काहीतरी पावले उचलावी ही रास्त अपेक्षा आहे .)
   मंदिरावरील शिल्प कला ही मंत्रमुग्ध करणारी आहे .संपूर्ण मंदिराला एका मेखलेने बद्ध केले आहे या मेखलेवरील शिल्पे डोळ्यांचे पारणे फेडतात . नंदिवर आसनस्थ शिव, तांडव मुद्रेतील शिव, धनुष्यबाण धारण केलेला पिनाकपाणी शिव,पद्मासनस्थ शिव , अशी कितीतरी शिवशिल्प मन मोहून टाकतात .
नृत्य गणेश , विणावादक गणेश , वरददायक गणेश अशी वेगवेगळ्या स्वरूपात गणेश शिल्प आढळतात .आश्चर्य म्हणजे हनुमानाचे शिल्प देखील या मेखलेवर विराजमान आहे .
    सर्वात आश्चर्य म्हणजे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची हुबेहूब प्रतिमा देखील येथे पाहायला मिळते .ही प्रतिमा बाहुबली गोमटेश्वराचीच का ? या विषयी निश्चित माहिती नसले तरी तेथील मूर्तीशी तिचे कमालीचे साधर्म्य आहे .
यावरून एक निष्कर्ष काढता येतो की या कारागिरांना गोमटेश्वराची माहिती असावी किंवा त्या निर्माणकार्यात यांचाही सहभाग असावा . त्या काळातील दळणवळण इतके प्रगत नसतांना असे साम्य पाहून मन थक्क होते .

मंदिर शिखराच्या वरच्या बाजूला दगडात कोरलेल्या पताका शिखर सौंदर्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात . त्यांच्यातील जिवंतपणा बघण्यासारखा आहे .
    मेखला पट्टीच्या खाली बाहेर धावणारी हत्तीशिल्पे , व वृषभशिल्पे दिसून येतात . जणूकाही मंदिराचा सगळा भार त्यांनी आपल्याच पाठीवर पेलून धरला आहे .
    हेमाडपंती महादेव मंदिर, पाटणादेवी मंदिराच्या वरच्या बाजूला गावक्षांचे कोरीवकाम अद्भुत आहे .या गवाक्षांना दोन नक्षीकाम केलेल्या स्तंभानी आधार दिला आहे तर खालच्या बाजूने अर्ध गोलाकार दगडी स्तंभांवर पेललेला भार नजर हटू देत नाही .एका गावक्षात कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती विस्मित करते .तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे .पायाखाली एका दैत्याला दाबले आहे .ते मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे .हे शिल्प बघतांना नृसिंहअवताराची आठवण येते . शुंभ निशुंभ यांचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील रंणचण्डिका कारागिरांनी हुबेहूब कोरली आहे .त्यांच्या प्रतिभशक्तीला लाख प्रणाम ! 
    उठाव शैलीतील हे शिल्प आज बरेच झिजलेले दिसते पण तरीही त्याचे सौंदर्य कमी होत नाही . मंदिराच्या प्रत्येक  कोनाड्यात यक्ष गंधर्व व नृत्यांगना यांच्या असंख्य प्रतिमाचा चपखल मेळ बसवलेला आहे . मंदिर निर्माण शास्त्राचा उत्तम अभ्यास असलेल्या कलाकारांच्या हातून या वास्तूचे निर्माण झाले आहे .यात तिळमात्र शंका नाही .
     मंदिराच्या उजव्या बाजूला दोन सात फूट उंचीचे स्तंभ उभे आहेत . त्यावर शंख चक्र गदाधारी विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत .बाजूला जय विजय उभे आहेत . हे बघतांना वेरूळ लेण्यांची आठवण येते . या मंदिर निर्माण काळात शैव व वैष्णव यांच्यात बरीच एकरूपता झाल्याचे दिसते .

मंदिराच्या बाहेरील बाजूस वेगवेगळया मुर्ती कोरलेल्या आहेत.

   ही प्राचीन वास्तू सन१९५८ च्या अधिनियम २४ नुसार पुरातत्वीय स्थळ व अवशेष म्हणून जाहीर करण्यात आली आहे . परंतु वास्तू संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत याचे वैषम्य वाटते .
   प्रत्येक गोष्ट कायद्याने संरक्षित होईल तेव्हाच का आपण तिचे संरक्षण करणार ? एक जबाबदार पर्यटक म्हणून आपणही प्रत्येक वास्तूचा आदर केला पाहिजे .आपल्याकडून त्या वास्तूला काही नुकसानतर पोहोचत नाही ना याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे .तरच हा अनमोल ठेवा आपण भावी पिढीसाठी संरक्षित ठेऊ शकू !
हे सर्व सुंदर अवशेष पाहाताना आपणास वेळकाळाचे भान राहात नाही. हे मंदिर बाराव्या शतकात निकुंभ राजवटीत बांधले गेल्याची मान्यता आहे.निकुंभ राजवटीतील इंद्रराजाने हे मंदिर बांधायला घेतले व त्याचा मुलगा गोविंद याने ते काम पुर्ण केले असा शिलालेखात उल्लेख आहे.

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...