Edited by amitsamant - 04 Dec 2013 at 1:18pm
बनेश्वर नावाची पुणे जिल्ह्य़ात दोन शिव मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे खुप नावाजलेले व सर्वांना परिचयाचे म्हणजे पुण्याजवळील नसरापुर येथील बनेश्वर मंदिर इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. तर त्याच्या विरुद्ध असलेले अजुन एक बनेश्वर मंदिर म्हणजे तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर मंदिर ..हे खुप प्रचिन मंदिर असून पर्यटकांपासुन वंचित राहिल्यामुळेच त्याची सुंदरता आज पण टिकून आहे. या मंदिराचे बांधकाम हे शुर पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळातले आहे. शिव शंभोचे भक्त असल्यामुळे त्यांनी बर्याच ठिकाणी शिव शंकराची मंदिरे उभारली आहेत. त्यातीलच हे एक मंदिर
मंदिराजवळ प्रवेश करताना पहिल्या अनेक समाधी (वीरगळ) दिसतात तर उजव्या बाजुला भारतातील पहिल्या महिला सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांची समाधी दिसते. पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाईंनी १७३२ साली खान ए खान जोरावर खान बाबी याचा गुजरातेत पराभव केला. एका महिला योद्धय़ाची ही अतुलनीय कामगिरी पाहून छत्रपती शाहू महाराजांनी उमाबाईंना सातारा येथे सोन्याचे तोडे, रत्नजडित तलवार व मानाची वस्त्रे देऊन सन्मानित केले.छोटे बांधीव तळे (काही अभ्यासक याला पुष्करणीदेखील म्हणतात) नंदीमंडप, सभामंडप व गाभारा अशी या मंदिराची ढोबळ रचना आहे.
या तळ्यावर पाणी उपसणाऱ्या मोटीसाठी जागा दिसते. तळ्यातील पाणी शेतीसाठी वापरले जात असण्याची शक्यता आहे. परंतु नंतरच्या काळात यातले पाणी वापरण्याजोगे न राहिल्याने तळ्याला ‘नासके तळे’ असेही म्हटले जाऊ लागले. तळ्यात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या दिसतात. ते काही ही असेना पण ही पुष्करणी खरच मनाच्या कोपऱ्यात घर नक्की करते.

हे तळे पाहून झाले की मग येतो नंदीमंडप. चार खांबांवर उभा असलेला हा मंडप संपूर्ण दगडात उभारला आहे. मुख्य मंदिराला न जोडता काही अंतरावर उभारला आहे. यातील नंदीची मूर्ती तर मंडपाहूनही देखणी. रिवाजाप्रमाणे नंदीवर माथा टेकवून पूर्वाभिमुख बनेश्वर मंदिराच्या सभा मंडपात जावे. संपूर्ण दगडात उभारलेल्या या मंदिराची स्थापत्य रचना खूपच आकर्षक आहे. सभामंडपात एकूण १६ खांब आहेत. खांबावर विशेष नक्षीकाम नसले तरी त्यांचे चौकोनी आणि गोल आकार मात्र पाहण्यासारखे आहेत. सभामंडपासमोरील छोटय़ाशा प्रवेशद्वारातून आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो. आतमध्ये खूपच सुंदर शिवपिंड आहे. गाभाऱ्यातील धीरगंभीर वातावरण व गारवा आवर्जून अनुभवावा असाच आहे.

आगळं-वेगळं पाच पांडव मंदिर
पाच पांडव मंदिर हे पांडवांचे संपूर्ण भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. तळेगावला आलो की थेट चावडी चौक गाठायचा. या चावडीच्या मागेच नागरीवस्तीत सामावलेलं छोटेखानी मंदिर नजरेस पडतं. पहिल्या खोलीत साधारण साडेचार फूट उंचीच्या पांडवांच्या बैठय़ा मूर्ती एकमेकांशेजारी ओळीत आहेत. डाव्या बाजूने सुरुवात केल्यास धर्मराज युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव अशा क्रमाने मूर्ती मांडलेल्या आहेत. धर्मराज युधिष्ठिर आणि भीम या दोन मूर्तीच्या मधोमध भिंतीला एक छोटीशी खिडकी दिसते. याच खिडकीतून द्रौपदीचे दर्शन घडते. पण ही मूर्ती पूर्णपणे पाहण्यासाठी आपल्याला आतल्या खोलीत जावे लागते. आत गेलो की, एका छोटय़ाशा चौथऱ्यावर द्रोपदी एका कुशीवर निजलेल्या स्थितीत दिसते.
घुमटाची विहीर
पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेंच्या काळात निर्मिली गेलेली आणि वास्तुस्थापत्याचा सुंदर आविष्कार असलेली ही विहीर पर्यटनाच्या दृष्टीने दुर्लक्षित का राहिली याचे आश्चर्यच वाटते. विहिरीजवळच्या घुमटाकार वास्तूमुळे विहिरीचं नाव ‘घुमटाची विहीर’ असे पडले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. बांधकाम घडीव दगडातच झालेले आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. आतील बाजूस मध्यभागी एक धक्का बांधलेला दिसतो. मध्यभागी दोन कमानी आहेत. त्यावर शिलालेखही कोरलेला आहे. या विहिरीवर दोन मोटी चालायच्या. त्यांचे धक्केही दिसतात. इतिहासकारांच्या मते या मोटीद्वारे शेतीला पाणी पुरवले जाई. विहिरीच्या आत छोटे शिवमंदिर आहे. विहिरीच्या बांधणीत किती मुद्दे विचारात घेतले आहेत हे पाहून आपण स्तंभित होतो.
बामणडोह
शिवलिंगाच्या आकाराची ही विहीर घुमटाच्या विहिरीसारखीच सुंदर आहे. संपूर्ण दगडातच बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या आहेत. साधारण मध्यभागी आलो की आतमध्ये फिरण्यासाठी गवाक्षांचा अर्धवर्तुळाकार मार्ग दिसतो आणि पाहणारा चकित होतो. बाहेर आलो की विहिरीवर असलेल्या मोटेच्या धक्क्य़ापाशी जावे. पाणी उपसण्यासाठी अशी बांधकामे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळतात.
गोनीदांचं घर

इंदुरीचा भुईकोट बघण्यासाठी पुण्यातून दोन पर्याय आहेत.पुणे-लोणावळा लोकलने तळेगावला उतरणे किंवा पुण्यातून तळेगाव दाभाडेसाठी थेट पि.एम.टी.ची बस सेवा आहे. आपल्या वहानाने देखील थेट तळेगावला जाता येईल. तळेगाववरुन इंदूरीला जाण्यासाठी सहा आसनी गाड्यांची सेवा उपलब्ध आहे.तळेगाव दाभाडेमधून चाकणकडे जाणाºया रस्त्यावर सुमारे पाच किलोमीटरवर इंद्रायणीनदीवर दोन पुल उभारलेले आहे. यातून छोट्या पुलाने इंदोरीच्या या भुईकोट किल्ल पाहता येतो.
पुणे – सोमाटणे फाटा ते तळेगाव दाभाडे गावठाण.
पुणे ते तळेगाव दाभाडे अंतर ४५ किलोमीटर.
वडगावची लढाई :-
जसे मराठी जगतात साडे तीन मुहूर्त, साडेतीन शहाणे, साडेतीन शक्तीपीठे तसे साडेतीन फाकडे.स्टुअर्ट या इंग्रजी साहेबाच्या नावाचा गावठी अपभ्रंश आहे! तो हुशार व तल्लख होता म्हणून फाकडा. फाकडा हा मराठी मधील अति वापरच शब्द जो काळाच्या पडद्या आड गेला.आज 99% मराठी लोकांना फाकडा या शब्दाचा अर्थ माहित नाही. पण काही दशकांपूर्वी सर्वात जास्त वापरणा-या शब्दांपैकी हा शब्द होता. फाकाडा म्हणजे देखणा हुशार शुर माणूस. स्टुअर्ट हा शब्द मराठी लोकांना म्हणायला यायचा नाही म्हणून त्याला इष्टुर असे बोलायचे. या साडेतीन फाकड्यांपैकी अर्धा फाकडा असलेल्या Captain James Stewart उर्फ 'इष्टुर फाकडा' याचे वडगांव मावळ येथे त्याचे थडगे आहे
बाकीचे तीन फाकडा म्हणजे.
1. कन्हेरराव त्रिंबक एकबोटे:-
नानासाहेब पेशव्यांच्या काळात साधारण शिपाई म्हणून नोकरीस आलेला एकबोटेने निजामाचा १७५१ मध्ये झालेल्या लढाईत फाकड म्हणून ओळखला जाऊ लागला. तळेगाव ढमढेेरे मध्ये मराठा लोक हिंदू सन साजरे करत असताना निझाम ना हल्ला केला. डी बुसी हा फ्रेंच आधिकारी निझामाच्या कवायती सेना पाहत होता. जेंव्हा त्यांचा तोफा मराठा क्या दिशेने हल्ला करत होत्या त्यावेळी एकबोटेनी समोर येऊन त्या तोफा निकामी केल्या.
2.मानाजी शिंदे
महादजी शिंदेच्या भावकी मध्ये असलेल्या शिंदे कुटुंबाचा हा देखणा आणि शुर मात्र रघुनाथ पेशव्यांचा पाठीराखा होता. बरभाईच्या काळात त्याने नाना फडणवीसची बाजू घेतली. उलट्या काळजाचा म्हणून प्रसिद्ध असलेला शिंदेच सरदार च तोंडावर शंभर तरी जखमेच्या व्रण होतें अनेक युद्धात पराक्रम गाजवलेल्या मानाजी शिंदे घाशीराम कोतवालने केलेल्या अनेक तेलांगी ब्राम्हणी ची हत्या जगासमोर आणली. अनेक इंग्रजी पत्रातून या शिंदेंच्या फाकड्याची कौतुके थांबत नाही.
3. कोन्हेरराव पटवर्धन
हत्ती माणूस म्हणून हा प्रसिद्ध होता कारण मोठे शरीर. १७७७ साली हैदर च्या युद्धात कोन्हेरराव पटवर्धन ४००० सैनिकांचे नेतृत्व करत होते . पण अचानक त्या युद्धात हैदर ची सरशी झाली आणि अनेक मराठा सैनिक पळू लागले. पण कोन्हेरराव पटवर्धन मात्र एकटे लढू लागले. जेंव्हा त्यांचे शरीर सापडले तेंव्हा धड एका बाजूला पडले होते . तोंडावर अनेक जखमा होत्या.
हे तीन मराठी फाकडे आता विस्मृतीत गेले असले तरी इंग्रज असलेला अर्धा फाकडा आज लोकांच्या स्मृतीत आजही जिवंत आहे.....सी ए Kincaid यांच्या मते फकडा या शब्दाचे इंग्लिश रुपतरण अशक्य आहे. ज्याप्रमाणे शुर आणि धाडसी लोकांना फ्रेंच मध्ये preux आणि इटली मध्ये Galannteumo असा पदवी आहे तशीच ही पदवी देखण्या शुर हुशार माणसाला दिली आहे असे या थोर इतिहासकारांचे म्हणणे आहे .
साल होतं १७७८. पेशवाईच्या गृहकलाहाचा काळ. नारायणराव पेशव्याचा खून घडवून आणणाऱ्या रघुनाथराव पेशव्याने बंड पुकारलं होतं. तो पेशवाईची गादी आपल्याला मिळावी म्हणून इंग्रजांना जाऊन मिळाला. या भाऊबंदकीचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा विनाश करायचा इंग्रजांनी बेत केला होता. प्रचंड मोठं इंग्लिश सैन्य पुण्यावर चाल करून आलं.
अटकेपार झेंडा लावणारा पराक्रमी राघोबादादाचा अनुभवी मार्गदर्शनाचा वापर करून पुणे सहज जिंकता येईल असं इंग्रजांना वाटत होत. मात्र त्यांच्या आणि विजयाच्या मध्ये एक माणूस उभा होता.
महादजी शिंदे.
बारभाईचा कारभार पाहणाऱ्या नाना फडणवीसांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवत होळकर, शिंदे, नागपूरकर भोसले या सगळ्यांना एकत्र आणलं होतं. पुणे दरबारच्या सैन्याच्या वेगवेगळया तुकडया केल्या गेल्या. हरिपंत फडके, रामचंद्र गणेश, बाजीपंत बर्वे, तुकोजी होळकर वगैरे सर्व सरदार आपापल्या सैन्यानिशी तळेगांवापासून बोरघाटापर्यंत माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द होते. महादजी शिंदे त्यांचं नेतृत्व करत होते.
इंग्रज सैन्याचे अधिपत्य कर्नल इगर्टन हयाच्याकडे होते, त्याने आपल्या सैन्याच्या मुख्य दोन तुकडया केल्या होत्या. व त्यांचे अधिपत्य लेप्टनंट-कर्नल कॉकबर्न व लेप्टनंट-कर्नल के हया दोन नामांकित सेनापतीस दिले होते.जेम्स स्टुअर्ट हा योध्दा फार कुशल योद्धा होता. त्याला मुंबईहून पुण्यापर्यंतच्या सर्व रस्त्यांची व घांटनाक्यांची पूर्ण माहिती होती. तो आपल्याबरोबर ग्रेनेडियर शिपायांची एक पलटण व थोडासा तोफखाना घेऊन ता. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईहून निघाला व आपटे नदीपर्यंत येऊन तेथून दुसरा मार्ग घेऊन मुंबईवरुन निघाल्यापासून तीन दिवसात बोरघाट चढून वर येऊन पोहोचला.
मराठ्यांनी पुणे मुंबई मधील बोर घाटाचा पुण्याकडील भाग रोखून धरला होता. मराठ्यांना हा मोठा धक्का होता. कारण तीन दिवसात मराठ्यांचा गनिमी कसा मोडत खंडाळा लोणावळा पार केला.बोरघाट चढून इंग्रज फौजा वर येताच त्यांना घेरण्याचा मराठी सरदारांनी डाव रचला. ता. २५ डिसेंबर रोजी ब्रिटीश सैन्य खंडाळ्यास आले.त्यानी खंडाळयाच्या उंच टेकडीवर ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे निशाण फडकवले.
पहिल्या इंग्रज-मराठा युद्धास प्रारंभ झाला. इकडे मराठयांचे सैन्य व तोफखाना शत्रूंशी तोड देण्याकरिता खंडाळयाच्या आजूबाजूस येऊन माऱ्याच्या जागा रोखून युध्दास सिध्द झाले होते. मराठयांच्या तोफखान्याचा मुख्य सेनापती होता भिवराव पानसे.
मराठा तुकडीमध्ये नरोन्हा नांवाचा एक फिरंगी गोलदाज होता. तो तोफा डागण्यामध्ये अतिशय कुशल होता. त्याने शत्रूंवर तोफांचा व बाणांचा असा मारा केला की, प्रत्येक खेपेस शत्रूंचा नामांकित शिपाई नेमका गोळयाखाली सापडत असे. शिवाय महादजी शिंदेंच्या खास तुकड्यानी गनिमी काव्याने घाटातील जंगलात ब्रिटीशांना हैराण करून सोडले होते.
एवढे असूनही कॅप्टन स्टुअर्ट याने आपल्या पराक्रमाची शर्थ करुन व मराठा तोफांचा भडिमार सहन करुन, कारल्यापर्यंत आपली फौज नेऊन पोहोचविली.मराठयांच्या सैन्यामध्ये इंग्रजी फौजातील गुप्त बातम्या येत असत. त्यांमध्ये कॅप्टन स्टुअर्टच्या शौर्याबद्दल, धैर्याबद्दल आणि युध्दचातुर्याबद्दल फार प्रशंसनीय उल्लेख असत. या कॅप्टन स्टुअर्टचा उल्लेख इष्ठूर म्हणून केला जायचा. सेनापती महादजी शिंदेना देखील त्याच्या युद्धचातुर्याचे कौतुक होते. त्याच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं विशेष लक्ष होत.
मुंबईची ( इंग्रजांची)फौज चालून येत असल्याचे समजताच शिंदे - होळकरांसह बव्हंशी मराठी सरदार पुण्याच्या बचावासाठी तळेगाव पर्यंत येऊन थडकले. कामशेत जवळ त्यांना पानसेंचा तोफखाना गाठ पडला.मराठ्यांचा कडवा विरोध ईश्टुर फाकडा उर्फ जेम्स स्टुअर्टने तोडला . त्याच्या झंझावात पुढे मराठा तुकडी कोलमडली. त्याचा पराक्रम पाहून अनेक जुने जाणते मराठा सैनिक बोलले शाब्बास स्टुअर्ट . ४ जानेवारी १७७९ रोजी अशाच एका निकराच्या चकमकीमध्ये स्टुअर्टला तोफेचा गोळा लागला. यात त्याचे धड एकीकडे आणि मस्तक एकीकडे जाऊन पडले. त्याच्या वीरमरणाची बातमी कळताच महादजींच्या तोंडून उद्गार बाहेर पडले,
“इष्टुर फांकडया शाबास !! ”
फाकडे म्हणजे पराक्रमी. कॅप्टन स्टुअर्टला तेव्हा पासून पेशवाईतील साडे तीन फाकड्यापैकी एक म्हणून ओळखल जाऊ लागला. मराठ्यांचा पत्रात सुद्धा त्याचे कौतुकच केले.इष्टुर फाकडा उर्फ स्टुअर्ड विल्यम्स एकदा एका पत्रात लिहला आहे. माणसाच्या आयुष्याची दिशा चुकली कि त्याची कशी केविलवाणी अवस्था होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रघुनाथराव आहेत. या माणसाने एकेकाळी मराठा फौजांच्या सह लढताना मोठा पराक्रम गाजवला आहे. सुदूर उत्तरेत त्याने मराठ्यांच्या साठी मोठ्या लढाया जिंकल्या आहेत. आज एक गोळी मस्तकाजवळून गेली आणि तो भीतीने थरथरला. त्यांची आजची अवस्था पाहून हा एकेकाळी इतका प्रसिद्ध योद्धा होता यावर विश्वास ठेवणे जड जाते.”
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) https://punetrekss.blogspot.com/2019/02/induri-fort.html
३) https://www.discovermh.com/baneshwar-temple-talegaon-dabhade/
४) http://travelzunlimited.blogspot.com/2010/12/talegaon-dabhade-photo-feature.html
५ ) श्री. अमेय गुप्ते यांचे लिखाण https://www.loksatta.com/kutumbkatta/historical-talegaon-in-the-pune-district-1769658/
६) छत्रपतींच्या सरसेनापतींचं गाव !- डॉ. सागर देशपांडे
७) https://e-abhivyakti.com
८) https://bolbhidu.com/ishtur-fakda-vadgaon-maval-anglo-maratha-war/
९) https://www.loksatta.com/vasturang/vastu-lekh/gopal-nilkanth-dandekar-house-pune-1601190/
रघुनाथराव पेशवेची आठवण
पेशवे पदासाठी रघुनाथ राव स्वराज्याला सोडून इंग्रजांना मिळाले आणि इंग्रजी मराठा पहिले युद्ध झाले . एका लढाईत एक गोळी राघोबादादांच्या डोक्याजवळून जाते आणि राघोबा दादा भीतीने थरथर कापतात.
2)Marathe Shahitil Vechak Vedhak (A collection of essays on the outstanding
and unknown facts of the Maratha Empire) – Y.N.Kelkar
३) Ishtur Phakde, a gallant Englishman and other studies”- C.A.Kincaid
४) Battles of the honourable East India Company: Making of the Raj-
M.S.Naravane
५)http://defenceforumindia.com/forum/threads/capt-james-stewart-died-
karla-maharashtra-state-india-04-jan-1779-first-anglo-mahra.19135/





























































