औरंगजेबाचा_हिसाब_धरीत_नाही
प्रस्तुत खालील पत्र हे जिंजीवरुन छत्रपती राजाराम महाराजांच्या तर्फे कदाचित खंडो बल्लाळ किंवा प्रल्हाद निराजी यांनी पाठवलेले असावे, हे पत्र लिहीलय महापराक्रमी बाजी सर्जेराव जेधे यांना, बाजी सर्जेराव जेधे हे शिवछत्रपतींच्या बहुतेक सर्व मोहिमांमध्ये आपल्याला आढळून येतात, तथापि शंभू छत्रपतींच्या काळात हे काहीकाळ मोगलाईत गेलेले होते व नंतर परत स्वगृही परत आल्यावर हे पत्र शंभू छत्रपतींच्या पश्चात ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांना स्वराज्य सोडून जिंजीला जावे लागले. </p><p> औरंगजेबाच्या फौजांना पांगविण्यासाठी हा उपाय योजावा लागला, खालील पत्रात रत्नोजी शिंदे आणि शंकराजी ढगे यांनी बाजी सर्जेराव जेधे यांच्या एकनिष्ठपणाची बाजू छत्रपती राजाराम महाराजांना सांगितल्यावर महाराज असे म्हटतायत की ते स्वतः जिंजीला गेल्यानंतर लाखाच्या वर मराठ्यांची फौज जमा झाली असून दक्षिणेतील पाळेगार व देसाई मंडळी पण मराठ्यांना सामिल होत आहेत, तशात केसो त्रिमळ पिंगळे यांना जिंजीवरुन स्वराज्यात एक लाख होन घेऊन ( खजिना ) पाठवले आहे, तसेच त्यांना आणायला संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांना रवाना केलय, म्हणजे त्यांच्या फौजेचा जमाव व इकडील लाखावर जमा झालेली फौज एकत्र येऊन औरंगजेबाच्या मोगल फौजेचा फडशा पाडू, असा या पत्राचा भाव आहे. यामध्ये बाजी सर्जेराव जेधे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी सहा गावांचे मोकासे आणि १००० होनांची तैनात बहाल केलेली आहे. तसेच औरंगजेबाच्या जवळील काही मराठ्यांना त्याने पुन्हा मुसलमान केल्याचे तसेच काही ब्राह्मणांना बाटवल्याचे पण या पत्रात आलेलं आहे (नेताजी राजे म्हणजे हा नेताजी पालकर असावा?, साबाजी घाटगे, जानोजी निंबाळकर?) काही मराठे वीर मोगलाईत गेलेले होते ते परत स्वगृही आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे ह्यात हणमंतराव निंबाळकर आणि सटवोजी निंबाळकर ही नावं येतायत. या पत्रात महत्त्वाची वाक्ये..
या_राज्याची_पोटतिडीक_धरता
संदर्भ - राजवाडे खंड १५ ( लेखांक ३४७ )
~अतुल तळाशिकर
टीप : विस्तारभयास्तव पूर्ण पत्र येथे देता येत नाही. इच्छुकांनी वरील दिलेला संदर्भ तपासावा.
*मराठ्यांच्या ६ हजार घोडदळाने कुत्बशाहाच्या राजवाड्याला गराडा घातला, पण माशीने पंख हलवले असते तरी ऐकू आले असते इतक्या शांतपणे !
गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुत्बशाहाच्या भेटीची. एक अनामिक डच माणूस या भेटीचा साक्षीदार होता आणि त्यानेच हे प्रत्यक्षदर्शी वर्णन लिहून ठेवले आहे. पुढची हकीगत त्याच्याच शब्दात, राजा शिवाजी एका दरवाजातून आत आला. ज्या लोकांना भेटी दरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी होती ते दुसऱ्या एका दरवाजाने आत आले. शत्रूचा विध्वंस करणाऱ्या त्या भयंकर शिवाजीला राजाची (कुत्बशाहाची) भेट घेण्याची खूण केली गेली , तेव्हा तो त्याला दाखवून दिलेल्या एका दरवाजातून आत आला, आणि कुत्बशाहा दुसऱ्या एका दरवाजाने तिथे उपस्थित झाला. त्यानंतर दोघेही आसनस्थ झाले आणि बोलणी सुरू झाली. त्यांची बोलणी चालू असतानाच, मराठ्यांच्या सहा हजार घोडदळाने कुत्बशाहाच्या राजवाड्याला गराडा घातला. हे घोडदळ इतक्या बेमालूमपणे आत आले की त्यावेळी एखाद्या माशीने जरी आपले पंख हलवले असते, तरी तो आवाज ऐकू आला असता ! ही गोष्ट मी ऐकीव माहिती वरुन सांगत नाहीये, कारण मी हे सर्व प्रत्यक्ष पाहिले आहे. एका खिडकीतून मला हे सर्व दिसत होते. हा शिवाजी म्हणजे दुसरा मँसँनिलोच (इटलीतील नेपल्स मधला एक लोकनेता) होता आणि मँसँनिलो प्रमाणेच शिवाजीच्या प्रजेला देखील त्याच्या विषयी अतिशय प्रेम आणि आदर वाटत असे.
~ English Records on Shivaji,
सत्येन सुभाष वेलणकर
भोर चा पत्ररूपी इतिहास:-
मौजे किकवी मध्ययुगात वैयक्तिक, राजकीय, आर्थिक कारणांनी पाटीलकीच्या वतनाचे व्यवहार होत असत. तसाच एक चूकीचा म्हणजे पाटीलकीचा घोटाळा असे म्हणता येईल अशी घटना पुढीलप्रमाणे. शिवकाळात मौजे किकवी हे गाव परगणे शिरवळ (पूर्वीचे सिरवल) मध्ये होते, येथील पाटीलकी "मंडाजी निगडे पाटील यांचेकडे होती. ती शके १५९७ म्हणजे इ. स. १६७५ मध्ये मलारजी मल्हारजी निगडे देशमुख; यांनी हिंदवी स्वराज्याचे स्थापत्यकार हिरोजी इंदुलकर (ज्यांनी राजधानी किल्ले रायगड बांधला) यांना परस्पर विकली, त्याची तक्रार मंडाजी निगडे पाटील यांनी शिवछत्रपतींकडे केली. त्यावर निर्णय देताना महाराजांनी हे पत्र बालाजी कुकाजी प्रभू हवालदार व कारकून परगणे सिरवल यांना ०९ सप्टेंबर १६७५ रोजी लिहिले आहे. जुना व्यवहार रद्द करून नवीन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याचे महाराज आदेश देतात. महाराज हा व्यवहार रद्द करून मंडाजी निगडे पाटील यांना त्यांची पाटीलकी व हिरोजी इंदुलकरांनी पाटीलकी साठी मल्हारजी निगडे देशमुख यास दिलेली रक्कम परत मिळवून दिली, तसेच मल्हारजीची चूक माफ करून त्यावर मेहेरबानी करून त्यांची देशमुखी देखील त्यांच्याकडे कायम केली. महाराजांना जाणता राजा का म्हणतात हे समजते. यातून तत्कालीन स्थानिक प्रशासकीय स्तरावरील अपहार आणि शिवछत्रपतींचे आदर्श न्यायधोरण व उत्कृष्ट प्रशासनव्यवस्था स्पष्ट होते.
संदर्भ:-
१. शिवछत्रपतींची पत्रे- खंड 2
२. खरे जंत्री
खुप सुंदर ऐतिहासीक माहिती वाचणास मिळाली.असे बरेच वतनाचे तंटे व त्याचे निवाडे मजहर इतिहास संशोधकांनी आभ्यासून अप्रगट इतिहास प्रगट करावा.बारा मावळ पेक्षा निरथडीत वतनाचे वाद तेव्हापासून आजपर्यंत चालूच आहेत.
हिरडस मावळच्या सरनोबतांचे बलिदान
विजापूरच्या अफजलखानाचा मारून विजय साजरा न करता राजे थेट करवीर पर्यंत धडकले, बापाचा सूड घेण्यायासाठी फाजलखान सोबत सिद्दी जोहर ला घेऊन आला, स्वराज्यावर पुन्हा संकट नको म्हणून महाराज मिरज चा वेढा सोडून पन्हाळ्यावर त्यांना अडवायला थांबले. चार महिने मुसळधार पावसात कडा पहारा पन्हाळ्यावर लागला होता, वेढा फोडण्याचे नेतोजीरावांचे प्रयत्न यश देत नव्हते, महाराज वेढ्यात पुरते अडकले. आता जास्त काळ वाट पाहून शक्य नव्हतं म्हणून एक धाडसी योजनेतून "शके १५८२ शार्वरीनाम संवत्सर आषाढ शुद्ध चतुर्थी" ला रात्री महाराज पन्हाळ्यातून ऐन रात्री हिरडस मावळतल्या बांदलांच्या निवडक 600 (काही साधनात हा आकडा १००० ते २००० आहे) मावळ्यांसह बाहेर पडले. मुसळधार पाऊस, चिखल, पाठीवर शत्रू आणि स्वराज्याच्या धनी घेऊन सारे उर फुटस्तोवर पळत होते. १२-१५ तास पळून कसेबसे "आषाढ कृष्ण एकादशीला" खेळणा म्हणजे विशाळगडावर पोहोचले. पण मागे सिद्दी जवळ आला, आता परत वेढा नको म्हणून महाराजांनी रायाजी बांदल देशमुखांना जोहरशी झुंजायाची आज्ञा केली पण बाजीप्रभू सरनोबत यांनी मध्यस्ती करुन ही ती जबाबाबदरी स्वतःवर घेतली, कारण रायाजी तेव्हा कोवळ्या वयात होते, लग्न- संसार झाला नव्हता. हिरडस मावळचे भविष्य असं रणांगणात खर्ची पडू नये म्हणून ते स्वतः पुढे निघाले, जातानाराजांना म्हंटले, आम्ही गेलो तरी मागे कुटुंब आणि रायाजी यांना पहावे, रायाजींना महाराजांच्या हाती देऊन, दर्शन घेऊन बाजी गडउतार झाले. इथे बाजींचा त्याग दिसून येतो.गडापासून चार मैलावर असलेल्या गजापूरचा खिंडीत जोराची झुंज झाली, बाजीप्रभू सरनोबत व इतर ५३ गावचे मावळेलोक मृत्यू पावले. पुढे रायजींनी महाराजांच्या परवानगीने त्या सर्वांवर अंत्यविधी केले. तसेच महाराजांनी पिसावरे येथे येऊन दिपाआवा बांदल देशमुख व रायाजी नाईक बांदल देशमुख यांचे सांत्वन केले, कारण कडवी फौज, आणि पराक्रमी सरनोबत त्यांनी गमावला होता. महाराज लगोलग शिंद येथे बाजींच्या घरी जाऊन त्यांच्या बायकामुले व भाऊबंदाचेही सांत्वन केले व कुटुंबियांची जबाबदारी घेतली. आणि महाराज राजगडावर दाखल झाले. बावाजी बाजीप्रभू या मुलास सेनापती जमेनिशी वतन व बापूजी बाजी प्रभू याना किले विशाळगड येथील करखानिशी दिली. राजगडावर भरलेल्या दरबारात जेधेंकडील मानाचे पहिले तलवारीचे पान बांदलांकडे आले ते रायाजींनी स्वीकारले.
१.या लढाईत कुठेही बाजी बांदल यांचा उल्लेख येत नाही कारण ते हयात नव्हते बाजीप्रभूंचा उल्लेख जेधे शकावलीत येतो तसा बाजी बांदल यांचा येत नाही.
२. अस्सल साधनात शिवा काशीद यांचाही उल्लेख येत नाही.
३. तसेच जे लोक म्हणतात की या युद्धातकान्होजी जेधेंचे जेष्ठ पुत्र बाजी सर्जेराव जेधे सामील होते तर तसा उल्लेख खुद्द जेधेंकडील जेधे शकवली मध्ये आढळत नाही.एक प्रसिद्ध कादंबरीमुळे गजापूर खिंडीतील हा संग्राम व एकूणच बांदल सेनेचा, बांदल देशमुखांचा इतिहास चुकीच्या लिखाणामुळे उपेक्षित राहिला. तसेच सध्या उगाच बाजीप्रभूंच्या अस्तित्वावर प्रश्न उभे केले जातात व बाजी बांदल यांचे नाव पुढे केले जाते, हे चुकीचे आहे. यासाठी समस्त बांदल व हिरडस मावळातील लोकांनी जागृत राहणे तसेच यावर शक्य तितके संशोधन व अभ्यास करणे गरजेचे आहे. बाजीप्रभू व हिरडस मावळतल्या सर्व अज्ञात वीरांना ऐतिहासिक भोर कडून भावपूर्ण श्रद्धांजली..
पत्रासारसंग्रह मधल्या ह्या ब्रिटिशांच्या पत्रातून खालील गोष्टींचे वर्णन येतं -
- दरबारात महाराजांना मिळालेली अपमानास्पद वागणूक
- ह्या वागणुकीचे महाराजांनी दिलेले तडफदार उत्तर
- महाराजांना नजरकैद
- महाराज व शंभूराजे पेटाऱ्यातून निसटल्याची नोंद
२ गोष्टी इथे लक्षात घेण्यासारख्या - एक म्हणजे राजे मनसबीच्या वचनांना भुलून, फसून औरंग्याच्या भेटीला गेले हा ब्रिटिशांचा दृष्टिकोन आणि तो साफ चुकीचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
दुसरे म्हणजे गनिमाला महाराजांची किती दहशत वाटत होती बघा - "शिवाजीपासून आपली मुक्तता झाली" ही नोंद आणि महाराज निसटून गेल्यावर गनिमाच्या प्रदेशात पसरलेले "भीती आणि संशय" ह्याचे वातावरण - ह्या २ नोंदी ह्याचाच पुरावा होय !!
★भोरचा पत्ररूपी इतिहास★
स्वराज्यावरील पहिले संकट म्हणजे फतेहखानाही स्वारी.
खळद बेलसर येथे ऑक्टोबर १६४८ ला झालेली लढाई. या लढाईसाठी विजापूरच्या मुहम्मद आदिलशहाने रोहिड खोऱ्यातील उत्रौली तर्फेचे केदारजी खोपडे… More देशमुखांना आजच्याच दिवशी म्हणजे ८ऑगस्ट १६४८ ला एक फर्मान धाडलं होतं. यात फतेहखानाला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. अशी फर्माने बऱ्याच देशमुखांना पोहोचली होती.
हिंदवी स्वराज्याची सेवा केल्याबद्दल तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांनी शंकराजी नारायण यांना "मदार -उल- महाम" हा किताब देऊन इमान दिला. भोरच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना काही मित्रांनी व प्रेक्षकांनी भोर… More संस्थांनच्या झेंड्याविषयी व राजचिन्हविषयी चौकशी केली, त्यात महत्वाचे म्हणजे झेंड्याच्या रंगाबद्दल बराच गोंधळ समोर आला. विकिपीडिया वर तो केसरी(भगवा) व हिरवा असा दोन रंगात दाखवला आहे तर काही जाणकारांनी भगवा रंग असल्याचे वाचनात आले असे सांगितले. मग बरेच दिवस याचा शोध सुरू होता. हिंदवी स्वराज्याच्या महत्वाच्या मंत्र्याच्या भागातील ध्वजामध्ये द्विरंग असण्याचे काहीच कारण नाही. अखेर संस्थानकलीन छायाचित्रांमध्ये भोरच्या पंतसचिव वाड्याचेदर्शनी भागातील छायाचित्र मिळाले त्याखाली स्पष्टपणे लिहिलेले… More
★ हिरडस मावळच्या सरनोबतांचे बलिदान
विजापूरच्या अफजलखानाचा मारून विजय साजरा न करता राजे थेट करवीर पर्यंत धडकले, बापाचा सूड घेण्यायासाठी फाजलखान सोबत सिद्दी जोहर ला घेऊन आला, स्वराज्यावर पुन्हा संकट नको म्हणून… More महाराज मिरज चा वेढा सोडून पन्हाळ्यावर त्यांना अडवायला थांबले. चार महिने मुसळधार पावसात कडा पहारा पन्हाळ्यावर लागला होता, वेढा फोडण्याचे नेतोजीरावांचे प्रयत्न यश देत नव्हते, महाराज वेढ्यात पुरते अडकले. आता जास्त काळ वाट पाहून शक्य नव्हतं म्हणून एक धाडसी योजनेतून "शके १५८२ शार्वरीनाम संवत्सर आषाढ शुद्ध चतुर्थी" ला रात्री महाराज पन्हाळ्यातून ऐन रात्री हिरडस मावळतल्या बांदलांच्या निवडक 600 (काही साधनात हा आकडा १००० ते २००० आहे) मावळ्यांसह बाहेर पडले. मुसळधार पाऊस, चिखल, पाठीवर शत्रू आणि…
• • • • • •
#बिंदू_माधव_मंदिर_आणि_धर्मांध_औरंगजेब
"ब-मुजीब निविश्ता रफीउल अमीन दिवान बनारस ब-अर्ज रसीद के बुतखाना बिंदमहादव मिस्मार नमूदा दर बाब अहदाश नमूदन. मस्जिद हर चे अम्र… More शवद. हुक्म शूद के तय्यार नूमायद"
बनारस येथील दिवाण रफीउलअमीन याच्या लिहिल्यावरुन समजले की, बिंदु माधवाचे देऊळ पाडून टाकले. मशिदीच्या उभारण्याबाबत हुकूम व्हावा. हुकूम झाला की उभारावी.
औरंगजेबाच्या दरबारचा अखबार, १३ सप्टेंबर १६८२
✒️ सत्येन सुभाष वेलणकर
हिंदूंच्या पाठशाळा आणि देवळे पाडून टाका , हिंदू धर्म सार्वजनिक रित्या पाळण्यावर ताबडतोब बंदी आणा - औरंगजेबाची राजाज्ञा **
**Demolish Hindu Schools and Temples,… More Prohibit Hindus from professing their faith publicly - Royal order of Mughal emperor Aurangzeb**
औरंगजेबाने दिलेली ही 'राजाज्ञा' ९ एप्रिल १६६९ ची असून, ती औरंगजेबाचे अधिकृत दरबारी चरित्र असलेल्या मआसिर ए आलमगिरी मध्ये दिली आहे. या आज्ञेचा मूळ फार्सी पाठ पुढील प्रमाणे :-
Aurangzeb issued the following order on 9th April 1669. The persian text of the order as given in Aurangzeb's official history, the Maasir-i-Alamgiri is as follows
**फार्सी पाठ ( Persian Text)**
ब-अर्ज ए ख़ुदावंद ए दीन परवर… More
जेधे देशमुखांच्या कौटुंबिक वादासंदर्भात शिवछत्रपतींचे बाजी सर्जाराऊ जेधे यांना पत्र
शके १५८४ आषाढ वद्य १
इ.स. ४ जुलै १६६९
स्वराज्याचे खंदे आधारस्तंभ म्हणून सरदार जेधे देशमुखांचा… More लौकिक मोठा. सरदार धाकले कान्होजी जेधे देशमुख यांच्या इ. स. १६६० मधील निंधनानंतर त्यांच्या बाजी, शिवाजी, संभाजी, चांदजी, नाईकजी आणि रायाजी या सहा मुलांमध्ये वाटणी झाली होती. ती पुन्हा इ. स. १६६८ मध्ये दुसऱ्यांदा झाली. पण थोरले बंधू बाजी जेधे आणि धाकटे बंधू शिवाजी जेधे या भावांमध्ये वितूष्ठ निर्माण झाले. ठरवून दिलेल्या कलमाप्रमाणे अंलबजावनी होत नाही, शिवाजी जेधे बाजींच्या वाटणीतील शेती कसत होते म्हणून बाजी (सर्जाराऊ)जेधे यांनी महाराजांकडे तक्रार केली. तेव्हा," झालेल्या निवड्याप्रमाणे… More
शाहिस्तेखान स्वारी इ. स. १६६२
◆ काल एक दिनविशेष चुकीच्या माहितीसह समाजमध्यामांवर प्रसारीत होत होता त्यासंदर्भाने ही पोस्ट आहे.
★ पत्रात कुठेही महाराज बाजींचे कौतुक करीत नाहीत.… More
पत्राबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
इ. स. १६६२ मध्ये जेव्हा शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडखोरे भोर तर्फेचे देशमुख बाजी सर्जाराऊ बीन कान्होजी जेधे यांना लिहिलेल्या काही पत्रांपैकी हे अस्सल मोडी पत्र व सोबत देवनागरी लिप्यांतर.
शाहिस्तेखान पुण्यात राहून स्वराज्यातील मुलुख खराब करीत होता. त्यातच काही खाजगी कारणास्तव बाजी सर्जाराऊ जेधे हे आपल्या वतनावर करी गावी रजेवर आले होते, बरेच दिवस ते कारील होते, ते रजा संपवून राजगडी दाखल होत नव्हते म्हणून लवकर… More
रायगडाबद्दलचा (पण रायगडावर नसलेला!) एक हरवलेला शिलालेख!
=======================
दुर्गराज रायगडावर असलेले शिलालेख आपल्याला माहीत असतात. गडावर मंदिराजवळचा संस्कृतमधला शिलालेख आपण बघितलेला असतो. पायरीवरचा ‘सेवेसी… More तत्पर हिरोजी इंदुलकर’ हा शिलालेख आपण वाचलेला असतो. आज जाणून घेऊयात अजून एका शिलालेखाबद्दल - जो फारसी भाषेत आहे पण ज्याबद्दल फारशी कुणास माहीती नाही - जो रायगडाबद्दलचा आहे आणि जो रायगडावर बसवायचा होता - पण ते झालं नाही. काय लिहीलं आहे त्या शिलालेखात? हे समजून घ्यायच्या आधी त्यावेळचा घटनाक्रम बघूयात.
औरंगजेबाची दख्खन दिग्विजय मोहीम जोरात सुरु होती. २५ मार्च १६८९ रोजी इतिकदखानाचा वेढा रायगडाभोवती पडायला सुरुवात झाली. सुमारे सात-सव्वासात महिने किल्लेदार चांगोजी काटकर आणि सोबत येसाजी… More
शिवरायांप्रमाणेच शंभुराजांचेही भोरशी दृढ नाते होते.
युद्धनीती, राजनीती, धर्मनीती, काव्यपंडित, धर्मपंडित, उत्तमप्रशासक, बहुभाषिक, कल्याणकारी शासक, अजिंक्ययोद्धा आशा किती तरी क्षेत्रात अवघ्या हिंदुस्थानात त्यांना टक्कर देईल असा कोणी नव्हता. वयाच्या ९ व्या वर्षांपासून ते ३२ व्या वर्षापर्यंत अव्याहत स्वराज्याचा विचार, प्रसार आणि सेवा शंभूराजांनी केली.
यवनांचे शासन आणि धर्म समूळ नष्ट करण्याचा मानस… More
छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञात समकालीन चित्र?
छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अप्रतिम असे इस्लामी आमदनीतील चित्रशैलीत काढले गेलेले चित्र...
छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही समकालीन अस्सल चित्रे सांगण्यात येतात… More त्यात हे चित्र कधी बघण्यात आले नाही. मात्र अशाच शैलीतील छत्रपती शिवाजी महाराजांची इतर काही चित्रे आहेत. मात्र हे थोडंसं वेगळं. चित्रावर उर्दू/पर्शियन मध्ये ‘सिवा’/‘शिवा’ असे लिहिलेले असून चित्रात महाराजांनी एका हातात फूल धरले आहे तर दुसरा हात कमरेच्या दांडपट्टयावर आहे. चित्राचा काळ १६८० असा नोंदवला आहे.
(शक्यतो महाराजांच्या हातात तलवार/दांडपट्टा दाखवले जाते मात्र या चित्रात दांडपट्टा बाजूने हातात धरलेला दर्शवला आहे)
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे हिंदूनृपती पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज.
छत्रपती शाहू महाराजांच्या जन्माविषयी नोंदी :
१) वैशाख वैद्य ७ दुदूंभी नाम संवत्सरे… More शके १६०४ गुरुवारी संभाजीराजे यांसी पुत्र जाला सिवाजीराजे नाव ठेविले
२) राजश्री संभाजीराजे यांस गंगोलीस पुत्र जाला शके १६०४ दुदूंभी नाम संवत्सरी वद्य सप्तमी जन्म झाला, नाव शिवाजीराजे ठेविले.
- संदर्भ : जेधे शकावली, करीना, खरे जंत्री
शाहूराजांविषयी चे बालपणातील अधिक विस्तृतपणे संदर्भ आढळून येत नाही, इ.स. १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगड शत्रूच्या ताब्यात गेला, स्वराज्यावर अतिशय बाका प्रसंग ओढवला होता अशाही परिस्थितीत महाराणी येसूबाईसाहेब यांनी प्रसंगावधान राखत अतिशय… More
★ भोरचा पत्ररूपी इतिहास
इ. स. १६६२ मध्ये जेव्हा शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहीडखोरे भोर तर्फेचे देशमुख बाजी सर्जाराऊ बीन कान्होजी जेधे यांना लिहिलेले हे अस्सल पत्र. सदर… More पत्रात जावळीचा उल्लेख आहे पण सर्जाराऊ जावळीस का निघाले हे कळत नाही. पत्रात उल्लेख केलेले दत्ताजी कंक याना महाराजांनी कौल दिला असे लिहिले आहे. पण हा कौल कशासाठी याचा उलगडा होत नाही.
(जाणकारांनी यावर भाष्य करावे.)
हे दत्ताजी कंक जेधेंच्याच जमावतील असावेत. आजही कारी येथे कंक यांचे एक घर आहे.
पत्राची सुरुवात *मसरुल अनाम* अशी आहे. वर महाराजांची मुद्रा, तिसऱ्या ओळीत "शिवनरपती हर्षनिदान महादेव मतिमत प्रधान" अशी एक प्रधान मुद्रा आहे.
जेव्हा मत्तबर , वरच्या दर्जाच्या सरदारास पत्र जात असे… More
छत्रपती शिवरायांनी जेव्हा अफजलखानाचा सामना करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी मावळतल्या सर्व देशमुखांना एकत्र करण्याची कामगिरी स्वतःच्या वतनावर पाणी सोडणाऱ्या रोहीडखोरे भोर तर्फेचे देशमुख सरदार कान्होजी जेधे यांना… More दिली .त्यांनी हिरडस मावळचे बांदल देशमुख , गुंजन मावळचे सिलिंबकर देशमुख (शिळीमकर), वेळवंड खोऱ्याचे डोहर धुमाळ देशमुख , मोसे खोऱ्याचे पासलकर देशमुख, मुठे खोऱ्याचे मारणे देशमुख, पौड खोऱ्याचे ढमाळे देशमुख , कानद खोऱ्याचे मरळ देशमुख या सर्वांसमोर " मऱ्हाष्ट्र राज्याची" संकल्पना मांडली आणि त्यांना महाराजांकडे वळवले. पुढे एकत्र झालेले मराठे अदिलशहा, कुतुबशहा, मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी या सर्वांना पुरून उरले. आणि स्वराज्य निर्माण झाले..
ध्यासपर्व-रंगो बापूजी गुप्ते.
मावळभूमी...वीरांची,लढवय्यांची आणि निष्ठावंतांची .मावळची भौगोलिक सुरवात होते ती रोहिडखोर्यातून .रोहिडखोर्याच्या पुरातन काळापासून दोन तर्फा पडतात उत्रौली तर्फे रोहिडखोरे आणि भोर… More तर्फे रोहिडखोरे.शिवचरित्राची सुरवात ज्या कालखंडापासून होते त्या कालखंडात ह्या रोहिडखोर्याच्या देशपांडे वतनदाराचे नाव दादजी नरसप्रभू गुप्ते असे येते."हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा "ह्या सुप्रसिद्ध आशयाचे पत्र महाराजांनी त्यांनाच लिहले.गुप्ते हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीचे.शिवपूर्वकाळात मावळात अनेक प्रभू घराणी स्थायिक झाली.बाजीप्रभू देशपांडे हि प्रभूच.ह्या प्रभू घराण्यांनी शेवटपर्यंत छत्रपतींच्या घराण्याचा ज्वाज्वल्य अभिमान धरला.प्रभू एकंदर तलवारीला तिखट .कलमदानाच्या… More
शिवराय प्रचंड बलाढ्य कुठे वाटतात माहितीये?
कृष्णाजी अनंत सभासद शिवरायांचे चरित्र लिहीत असतो.. सुरतेच्या
स्वारीनंतर केलेली कांचनबारीची लढाई तो स्वतःच्या नजरेसमोर उभी
करतो.. अंगात असणाऱ्या पूर्ण… More ताकदीनिशी लेखणी उचलतो.. आणि
कांचनबारीच्या युद्धाची सुरुवात करताना जोशात कागदावर अक्षरे
उमटू लागतात..
"राजा खासा घोड्यावर बसून बख्तर घुगी घालून, हाती पटे चढवून
मालमत्ता घोडी, पाईचे लोक पुढे रवाना करून, आपण दहा हजार
स्वारांनिशी सडे सडे राउत उभे राहीले.."
दोन्ही हातात शस्त्र घेऊन आपला नेता, आपला सेनापती, आपला
राजा समोर उभा आहे.. शत्रूला तोंड देण्यासाठी एकटाच समर्थ आहे..
हे दृश्य पाहून त्या दहा हजार सैन्यामध्ये काय ऊर्जा सामावली असेल?
शिवराय 'महाबली' भासतात ते इथे..
असे अनेक प्रसंग… More
शाहजी महाराज "स्वराज्य संकल्पक" च....
रियासतकार गो .स सरदेसाई ह्यांनी मराठा रियासतीचे जेव्हा सलग खंड लिहिले त्यात पहिल्या खंडातल्या पहिल्या भागाचे नामकरण "स्वराज्य संकल्पक शाहजी" असे ठेवले .स्वराज्य… More निर्मितीचे संपूर्ण श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांचे .पण ह्या वटवृक्षाचे बीज हे शहाजी महाराजांनीच लावले होते.रियासतकरांच्या प्रदिर्घ व्यासंगाला आणि अभ्यासाला दाद द्यायलाच हवी.स्वराज हि प्रदिर्घ प्रक्रिया आहे.अचानक ठिणगी पडली आणि वणवा लागला असे नैमित्तिक स्वरुप त्याचे नाही...भोसले घराण्याच्या एकूण तीन शाखा भोसले ,घोरपडे ,सावंत सोळाव्या शतकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत.मोगलाई,आदिलशाही,निजामशाही ह्या मुसलमानी सत्तांमधून त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला होता.....
अफजलवध आणि शिवरायांनी आयुधे
शके १५८१ विकारी संवत्सर मार्गशीर्ष षष्ठीसह सप्तमी गुरुवार दि. १० नोव्हेंबर १६५९ दुपारी प्रतापगड युद्धावेळी शिवछत्रपतींनी कोणत्या हत्याराने अफजलखान मारला याबद्दल बरेच वादविवाद आहेत.… More
खाली कोणत्या ग्रंथात कोणत्या हत्याराचा उल्लेख आहे याची यादी देत आहे.
१. सभासद- वाघनख व बिचवा.
२. चिटणीस- वाघनख व तलवार.
३. जेधे करीना-वाघनख व तलवार
४.९१ कलमी बखर- बिचवा व तलवार,
५. शिव दिग्विजय- बाघनख व पट्टा.
६. रायरी बखर-कठ्यार.
७. तरीख-इ-शिवाजी- वाघनख व कट्यार
८. इंग्रजीपत्र- पोटाजवळ लपवून ठेवलेली कट्यार,
९. फायर- अस्तनीत लपवून ठेवलेला जंब्या (Stiletto).
१०. खाफीखान- कट्यार.
११. मनुक्की -भाल्याच्या आकृतीचे छोटें आखूड दुधारी हत्यार.
१२.जेधे शकावलि - हत्याराचें नांव नाही.
" भेटीचे… More
शंभूछत्रपती आणि भोर◆
बहराला आलेल्या मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याला नजर लागली आणि थोरले महाराज वयाच्या ५० व्या वर्षी गगन मंडळ भेदून दिगंत प्रवासाला निघून गेले. आधी महाराजसाहेब, जिजाऊ मासाहेब आणि आता स्वतः थोरले स्वामी स्वराज्याला पोरकं पोरकं करून गेले. भविष्य अनेक थरारक घटनांची चाहूल देत होतं, यातही अनेक लोकांनी युवराज शंभूराजांना गादीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न केले पण ते या कटात यशस्वी झाले नाहीत. जड अंतकरणाने आणि जबाबदारीच्या जाणिवेने शंभूराजे सिंहासनाधीश्वर झाले. लागलीच बुऱ्हाणपुरची मोहित फत्ते केली, पुढे मुघल युवराज अकबर, पोर्तुगीज, चिक्कदेवराय, फ्रेंच, इंग्रज, सिद्धी , अंतर्गत शत्रू ते जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत औरंग्याशी सलग ९ वर्ष झुंजले. डाव अर्धव असताना कैद झाली आणि काळाशी गाठ पडली पण त्यांच्या या बलिदानाने पुढे मराठ्यांनी मुघलशाही खिळखिळी केली, औरंग्याला खडकीत गाडला. महाराणी येसूबाई, छत्रपती राजाराम, महाराणी ताराराणी, छत्रपती शाहू थोरले(दुसरे शिवाजीराजे ) यांनी पराक्रमाने स्वराज्याला मराठ्यांचे साम्राज्य बनवून पुनःस्थापित केलं.
★ सईबाई राणीसाहेबांच्या निधनांनातर कापूरहोळच्या धाराऊ गाडे पाटील यांनी बाळ शंभूराजांची दुधाई म्हणून जबाबदारी घेतली, आणि भोरशी त्याचं नातं लहान वयातच दृढ झालं.
★ फोंड्याच्या लढाईत सरसेनापती येसाजी कंकांचे पुत्र कृष्णाजी कंक खस्त झाले, शंभूराजांनी कंक घराण्याची स्वराज्याप्रति सेवा पाहून दरवर्षी १ शेर सोन्याची मोईन करून दिली आणि राजाचं कर्तव्य पाडलं.
★औरंग्यानं मावळात हैदोस घातलेला असतानाच घरगुती कारणांनी वाट चुकून शिरवळ ठाण्यात दाखल झालेले रोहिड खोऱ्याच्या भोर तर्फेचे बाजी (सर्जेराव) बीन कान्होजी जेधे देशमुख यांना त्यांच्या जबाबदारीची आणि चुकीची जाणीव अगदी कडक शब्दात शंभूराजे करून देतात.
★ उत्कृष्ठ सेनापती, राजा, राजकारणी, अनेक भाषांचे जाणकार असणारे ब्रीजभाषा आणि संस्कृतपंडित असणारे शंभूराजे-नृपशंभु आपल्या काव्यातून बांदल सेनेच्या पराक्रमाचं बोटभर कौतुक करतात ते असं:-
"भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः ॥
मज्जैत्र यत्राः कुवर्णाः प्रोल्लो सन्ति पदे पदे ""
अर्थ- "हिरडस मावळामधे लोकप्रिय असणारे राजेबांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत,प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवीत आहेत.”











No comments:
Post a Comment